अकोले तालुक्याला अनेक निसर्ग संपन्न गडदुर्गांचा वारसा लाभलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कळसुबाईच्या सर्वोच्च शिखराबरोबरच रतनगड, हरिश्चंद्र गड, विश्रामगड, भैरवगड, कुंजरगड आदी महत्त्वपूर्ण गड आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी साधले घाटातुन हरीश्चंद्रगडावर येणाऱ्या मार्गावर तसेच मुळा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी साधले घाटाच्या माथ्यावर कलाडगड हा टेहळणीचा किल्ला बांधला गेला. हरिश्चंद्रगडाच्या पश्चिमेला कलाडगड आहे. गडाची एकुण रचना पहाता हा किल्ला हरिश्चंद्रगडाला समकालीन असावा. कलाडगडाच्या सभोवताली असणारी निसर्ग सौंदर्याची खाण आणि आदिवासी संस्कृती, जनजीवन आपल्या दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आपण एकदा तरी या किल्ल्याला भेट दिली पाहिजे.

कलाडगडाचाडोंगर एकांतात वसलेला डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्या मंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. मुळा नदी म्हणल्यावर बहुतेकांना पुणे शहरातून वाहणारी मुळा नदी आठवेल.मात्र हि मुळा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. रतनगडाच्या पाठीमागे अस्णार्या अजोबा डोंगरावर हिचा उगम होतो. एखाद्या खेळायला जाणार्या अवखळ मुलीने आपल्या बरोबर मैत्रीणी गोळा करत निघावे, तशी हि मुळा नदी हरिश्चंद्रगडावरुन येणार्या मंगळगंगेला आपल्या सोबत घेते. पुढे रतनगडाच्या माथ्यावरुन येणार्या प्रवरा नदीशी हिची गाठ पडते ती ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका सांगितलेल्या नेवाश्याजवळ. शेवटी सातवाहनांच्या राजधानीजवळ म्हणजे पैठण जवळ यांची गाठ पडते, त्रिंबकवरुन उगम पावून पुर्वेकडे धावत सुटलेल्या गोदावरीकडे. पुढे यांना आणखी सरिता मिळतात आणि हा संघ वंग सागरात सामिल होण्यासाठी निघतो.

अश्या या मूळा नदीच्या खोर्यातील कलाडगडवर जायचे तर पायथ्याचे गाव म्हणजे 'पेठेची वाडी'.मात्र गाव एका बाजुला रहात असल्यामुळे व दुर्गम असल्यामुळे कलाड्गडाला जायचे तर हरिश्चण्द्रगडाच्या उत्तर पायथ्याचे पाचनई हे गावच कलाडगडाला जाण्यासाठी मुक्कामाच्या दृष्टीने सोयीचे आहे.
किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?
मुंबईहुन दोन मार्गाने गडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
१) मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर ( कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (कोळथेच्या भैरवगडाच्या पायथ्याचे गाव अंतर २५ किमी) कोथळेच्या पुढे ५ किमीवर पाचनई गावात जाणारा फ़ाटा आहे. फ़ाट्यापासून पाचनई ७ किमी वर आहे.कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी, हे गाव पाचनई पासुन ७ किमीवर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचनई पासुन ५ किमीवर आहे. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे.
२) मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्या रस्त्यावर राजुरपासुन - माणिक ओझर -खडकी - वाघदरी यामार्गे पाचनई २७ किमीवर आहे. कलाडगड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पेठेवाडी, हे गाव पाचनई पासुन ७ किमीवर आहे. पण किल्ल्यावर जाणारी वाट पाचनई पासुन ५ किमीवर आहे. वनखात्याने इथे सिमेंटचा निवारा बांधल्याने ही जागा शोधणे सोपे झालेले आहे.
३) पुण्यावरून येणार असाल तर आधी संगमनेरला यावं लागेल(१५६ कि. मी.), तेथून अकोले तालुक्यातील राजूर या बसस्थानकावरून पाचनई गावाची बस पकडून यायचं. पाचनई पासून ७ कि. मी. अंतरावर पेठेवाडी गाव परंतु तिथे न जाता अलिकडेच म्हणजे ५ की.मी. वर आपल्याला गडाचा पायथा लागतो.
४) गडावर येण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटातील खिरेश्वर नावाचे गाव आहे. हे गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारणतः ४ तासांच्या पायपीटीचा मार्ग आहे. किंवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन दुर्गप्रेमी पाचनई गावात उतरू शकतात.
हरीशचंद्रगडाच्या पाठीमागे वसलेला एक एकटा डोंगर म्हणजे कलाडगड होय. आपल्या प्रवासात पाचनई गावात पोहोचल्यावर आपल्याला पश्चिम दिशेला दिसणारा डोंगर म्हणजे कलाडगड! पाचनई या हरीशचंद्रगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे.किल्ल्यावर जाताना सुरक्षिततेच्या दृष्टीने ४० फुटी रोप बरोबर बाळगावा.
पाचनई. सह्याद्रीच्या माथ्यावरलं एक सुंदर गाव. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरची गावं देखणी वाटतात, मग ते पायथ्याचं असो, पदरातलं अथवा माथ्यावरलं. पाचनई एक रस्ता पेठाच्या वाडीला जातो. वाडीला खेटून उभा आहे कलाडगड.
पाचनई गावातून प्रवासाला सुरुवात करायची( तशी अकोले तालुक्यात आले की आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. कलाडगडच्या पायथ्याचे पेठेवाडी गाव पाचनई पासुन ७ कि.मी.वर असुन किल्ल्यावर जाणारी वाट गावाच्या अलीकडे म्हणजे पाचनई पासुन ५ किमीवर आहे.
पाचनईमधून गाडीरस्ता धरुन चालायला सुरवात करायची. पाचेक मिनीटे चालले कि डावीकडील पठारावार चढणारी वाट धरायची. पठार पार करुन पलिकडच्या सोंडेवरुन खाली उतरुन गेले कि पुढे एक टेकडी येते. त्या टेकडीवरुन मंगळगंगेच्या प्रवाहाला पार करुन एक वाट आपल्यापर्यंत आलेली दिसते.हि वाट कुमशेतवरुन पाचनईकडे येते. आपण मात्र मंगळगंगेचे पात्र ओलांडून टेकडीवर न चढता डावीकडे वळायचे कि कलाडगड दिसु लागतो.

हा ओळ्खायची खुण म्हणजे कलाडगडाला चिकटून असणार्या डोंगरामुळे इंग्रजी 'V' आकाराची खाच तयार झालेली आहे. उजवीकडचा मोठा डोंगर म्हणजेच कलाड्गड. इथे पोहचायला पाचनईमधून अर्धा तास लाअग्तो.यापुढील वाटचाल उजव्या बाजुला असलेल्या ओढ्याच्या संगतीने सुरु होते. दहा मिनीटात ओढा ओलांडून पलिकडच्या पायवाटेने वाटचाल सुरु करायची. आपण सोडलेली पायवाट साधले घाटाच्या दिशेने जाते. समोर दिसणार्या कलाडगडापासून दुसर्या टेकडीवर आपली वाट आहे हे लक्षात ठेवायचे. टेकडीचा माथा गाठून कलाडकडे चालत रहायचे.इथे एक वाट उजवीकडे वळते.ती वाट पेठेच्या वाडीला जाते. सरळ जाणार्या वाटेने आपण कलाडच्या पायथ्याशी पोहचतो. पाचनईमधून तास दीडतासामध्ये चालत कलाडगडाच्या पायथ्याला आपणास पोहचता येते परंतु स्वताची गाडी असेल तर अती उत्तम आणि लवकरच रस्ताही अतिशय चांगला होण्याची शक्यता आहे. कारण सध्या येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे. पाचनई मधून एक कच्च्या रस्त्याने जवळपास दीड दोन तासाच्या पायी पायपीटीनंतर आपण पेठेवाडीच्या अलीकडील शासनाने बांधलेल्या एका सिमेंटच्या निवाऱ्याशेजारी येऊन पोहोचतो. किल्ल्याच्या ज्या धारेवरुन आपण चढाई करतो ती पूर्वेला असल्याने सकाळी लवकर चढाई करावी. त्यावेळी दगड तापलेला नसेल आणि चढता उतरताना त्याचा त्रास होणार नाही.पावसाळ्यात किल्ल्यावर जाणे टाळावे. सप्टेंबर ते फेब्रुवारी हा कलाडगडाला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. पाचनई मधून कलाडगडासाठी सोबतीला वाटाड्या घेतला की तो मधल्या मार्गे फक्त १ तासात तुम्हाला या ठिकाणी आणून पोहोच करतो.

कलाडगडाच्या उत्तर-दक्षिण पसरलेल्या धारेवर दक्षिणेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. पेठेच्या वाडीकडे जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुला वनखात्याने सिमेंटचा निवारा बांधला आहे. येथे एका झाडाखालून गडाची पायवाट वर जाताना दिसते. गडावरच्या भैरोबाला स्थानिक गावकरी जात असल्याने गडावर जाणारी वाट बऱ्यापैकी मळलेली आहे. पेठेची वाडी गाव मुळा नदीच्या तीरावर वसलेले आहे, समुद्रसपाटीपासुन ८६० मीटर उंचीवर आहे. लव्हाळी-पाचनई-पेठेचीवाडी हा रस्ता या गावात येउन थांबतो. गावात ठाकर समाजाची वस्ती असुन येथे २ लहान देवळे आहेत. मरिआई व भैरोबाच्या या देवळात पाट आहेत. लाकडी पाटांवर देवाच्या पट्ट्या आहेत. नक्षीकाम आहे. देवळाबाहेर तुती (मलबेरी) चे झाड आहे. पावसाळ्यानंतर झाडावर लाल काळी फळे असतात. गडाचा पायथा गावापासुन अंदाजे १ कि मी आहे. गडावर पोहोचण्यास अंदाजे २००-२२५ मीटर चढावे लागते.. स्वत:चं वाहन असेल तर कलाडगड चढण्यासाठी पेठेच्या वाडीत जाण्याची काहीच गरज नाही. पेठेच्या वाडीकडे जाताना रस्त्याच्या मधूनच एका झाडाखालून गडाची प्रशस्त पायवाट गेली आहे. पण स्थानिक माणूस सोबत नसेल तर ही सुरुवात सापडणं केवळ अशक्य.

कलाडगड आहे लहानसा पण पहिल्या पाउलापासून जी चढण सुरु होते ती अगदी माथा गाठेपर्यंत. साधारण १० मिनिटे झाडीतून चालल्यावर आपण उघड्या जागी येतो. इथुन माथ्यावर जाईपर्यंत तीन ठिकाणी खड्या चढाईचे कातळ-टप्पे लागतात. आपल्याला जर वाटाड्याने आणले असेल तर वाटेत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आपल्याला ओढ्यांची, झाडांची आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाची सोबत नक्की लाभेल. आता तुमच्या डाव्या हाताला जो डोंगर दिसतोय तो म्हणजे कलाडगड होय. आता दाट झाडीमधून आपण प्रवासाला सुरुवात करायची, अर्ध्या तासाच्या आल्हाददायक पण खड्या चढाई नंतर आपण येऊन पोहोचतो कातळकोरीव अशा दुसऱ्या टप्प्याकडे.
पहिल्या टप्प्यात सुरवातीला काही दगडाना शेंदुर फासुन देवपण देण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यातच कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या पार करून साधारण अर्ध्या तासाची उभी चढण असलेला दुसरा टप्प्यापाशी पोहचतो. इथे कातळात कोरलेला एक अवघड टप्पा लागतो. इथे काळजी घेणे गरजेचे आहे.
या कातळात जेमतेम पाय कसाबसा बसेल इतक्याच जागेच्या खोबण्या केलेल्या आहे. या खोबान्यांमध्ये हाताची मजबूत पकड बनवत हळूहळू पाय रुतवत तिरके तिरके जात हा अवघड टप्पा पूर्ण करायचा.सोबत एखादा प्रशिक्षित ट्रेकर असेल तर त्याने अगोदर वर जाऊन नंतर दोरीच्या सहाय्याने इतरांना संरक्षण देत हा टप्पा पार केला तर अति उत्तम.
हा टप्पा पार करून आपण एका कातळ भिंतीसमोर खडकात खोदलेल्या तिसऱ्या टप्प्यातील पायऱ्यापाशी येऊन पोहोचतो. जेमतेम पाउल ठेवता येईल अशा या पायऱ्या कातळात तिरकस कोरलल्या आहेत.
या पायऱ्यावर पाय रोवत व हातांचा आधार घेत समोर आलेली कातळभिंत सांभाळून पार करत आपण एका चौकोनी जमिनीखाली खोदलेल्या भैरोबाच्या गुहेपाशी पोहोचतो. या गुहेत भैरवाचा शेंदूर फासलेला एक तांदळा, गणपतीचे छोटेसे शिल्प, वाघाचे शिल्प बघायला मिळते.
जमिनीखाली खडकात खोदलेल्या या गुहेत शेंदूर फासलेला भैरोबा असुन बाहेरील बाजुस उघडयावर २ सर्पशिल्प ठेवलेली दिसतात. काही भक्तांचं गा-हाणं ऐकायला तर काहींच्या धन्यवादाचा स्वीकार करायला हा भैरोबा अश्या अवघड जागी वसला आहे.
त्यासमोर साकीरवाडीच्या गावक-यांनी बसवलेली एक तांब्याची मोठी घंटा आहे. तिचा घंटानाद केला कि त्या आवाजात आतापर्यंतचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.भैरोबाच्या डावीकडे दिव्याचा स्तंभ असुन, समोर शिळा आहे. शेंदुर फासल्यामुळे शिळेवरचे कोरिवकाम अस्पष्ट झाले आहे. गुहेत कमालीचा गारवा असतो. गुहेला भेगा असुन त्यात पाणी ठिबकते.
डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाट तशी अवघड नाहीये परंतु अरुंद आहे आणि शेजारीच दरी असल्याने धोक्याची देखील आहे.पुढे गेल्यावर या वाटेने तुम्हाला दोन पाण्याचे टाके लागतील. या पाण्याच्या टाक्यांत दगड पडलेले आहेत व उपसा नाही त्यामुळे पाणी पिण्यायोग्य नाहीये.
या टाक्याच्या अलीकडे एका उध्वस्त वास्तूचे अवशेष दिसतात. पायथ्यापासून येथे यायला साधारण १ तास लागतो. टाके पाहून पुढे आपण एक सपाट माथ्यावर येऊन पोहोचतो.
कलाडगडाची बांधणी आणि एकंदरीत स्थान बघता हा गड निश्चितच प्राचीन असावा. कलाडगड आणि त्याच स्थान पाहता, हे एक महत्वाच टेहळणीच ठाण असाव अस वाटत. कलाडगडाची तशी इतिहासात नोंद नाहीये परंतु जसा हरिश्चंद्रगड बांधला त्याप्रमाणे आणि तेव्हाच कलाडगड देखील बांधला असावा असा अंदाज आहे. असा अंदाज बांधण्याचे कारण म्हणजे आज्ञापत्रात म्हणाल्या प्रमाणे गडाशेजारी जर दुसरा डोंगर असेल तर तो समूळ फोडून नष्ट करावा आणि ते शक्य नसेल तर तो देखील बांधून काढावा. कातळात तयार झालेला हा डोंगर फोडून काढणे शक्य नव्हते त्यामळे कदाचित याला बांधून काढले असावे.शिवकाळात मराठ्यांनी या परिसरातील इतर गडांबरोबर १६७०-७१ मध्ये हा गड अंमलाखाली आणला. पुढे १६८८-८९ मध्ये हा गड मोघलांनी घेइपर्यंत स्वराज्यात होता.पुन्हा मराठी अंमलाखाली हा गड येण्यासाठी १७४७-४८ उजाडावे लागले.इतर गिरीदुर्गांप्रमाणे या गडाचे इंग्रजांनी काही नुकसान केले नाही याचा अर्थ शेवटी शेवटी हा गड बेवसावू झाला असावा.

गडाचा हा इतिहास मनात घोळवत गडफेरी चालु ठेवायची, गडाच्या त्याच टोकाला असलेली छोटीसी देवळी आणि तिच्यासमोर ठेवलेले दोन गोल दगड त्या सुकलेल्या पिवळ्या गवतात उठून दिसतात. हा आहे 'वेताळाचा माळ'. कदाचित हे तोफेची गोळे असावेत. एक गोष्ट बरी केलीये त्यांना शेंदूर लावून देवाचं रूप दिलंय त्यात हे वेताळाचे देऊळ त्यामुळे कोणी हे दगड हलवण्याचा प्रयत्न नाही करत. गडावर ठेवलेल्या तोफा किंवा तोफगोळे पर्यटक मनोरंजन म्हणून दरीत ढकलून देतात. या गडावर देवाचे रूप देऊन का होईना पण आजपर्यंत हे गोळे तसेच बघायला मिळताय ही एक आनंदाची बाब आहे. या जागेला वेताळाचा चाळा असे म्हणतात.गावकरी इच्छा मनात धरुन दगड उचलतात. वरवर अंधश्रद्धा वाटत असली तरी हा प्रकार म्हणजे मनात गाठ मारण्याचा एक प्रकार आहे.
न्हाप्ता सुळके
बसलेल्या नंदीप्रमाणे दिसणारा कलाडचा अंगठा
टुमदार असं पेठेची वाडी गाव
कोंबडा सुळका
 |
| नाफ्ता |
या टोकावरून पाहिल्यावर समोर सह्याद्रीची बेलाग कडे डोळ्यांचे पारणे फेडते. परत थोड मागे येऊन, पाण्याच्या टाक्याकडून, सुकलेल गवत सांभाळून तुडवत वर गडाच्या माथ्यावर पोहोचलो कि इथे थोड दगडी बांधकाम दिसते जे बहुतेक गडावरील घराचं असाव. आता गडाच्या उजव्या बाजूला देखील तसेच रेखीव कडे लांबच लांब पसरलेले दिसतात. कलाडगगडाची उंची समुद्रसपाटीपासून ३७६९ फुट असुन चिंचोळा माथा असलेला हा गड दक्षिणोत्तर साधारण ५ एकरवर पसरलेला आहे.
खरतर गड फार महत्वाचा नाही, खुप अवशेष बघायला मिळतात असे नाही.चढाई हि अवघड आहे, मग हे जीवावरचे धाडस करायचे तरी कशासाठी ? याचे उत्तर म्हणजे कलाडगडाच्या माथ्यावरुन दिसणारा सह्याद्रीचा अप्रतिम पॅनोरमा. अगदी जवळ पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा एक सुळका दिसतो. रतनगडाचा खुट्टा आपण बघितला त्याप्रमाणेच कलाडगडाला देखील असा एक सुळका आहे ज्याला कलाडचा अंगठा असे म्हणतात.
आजुबाजुला दिस्णारा पुरुषी निसर्ग आपल्या डोळ्याचे पारणे फेडतो. पुर्वेला हरिश्चंद्रगड-तारामतीची रांग आणि पश्चिमेला मुळा नदीचा आनंद आपण घेतला तिचे उगमस्थान असणारा आजोबा पर्वत, कात्राबाईचा डोंगर, कुमशेतचा कोंबडा,माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्याघाटाजवळचा नकटा डोंगर, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा रांगडा सह्याद्री या गडाने वेढलेला आहे. हे सगळ पाहणाऱ्या एखाद्या भटक्याला हे कातळ, हिरवगार खोर जणू मोत्यासारखे वाटतिल, निळ्याक्षार आकाशाच्या धाग्यात गुंफलेले. निसर्गाचा हा अदभुत नजारा पहाताना भान हरवते. याच मनस्थितीत गडाची वाट खड्तर वाट आपण कधी उतरुन आलो ते कळतही नाही.
संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
५) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६) www.durgabharari.in हि वेबसाईट
७) https://www.garvanemarathi.com, https://trekhunt.blogspot.com,, http://www.onkaroak.com, https://adimculture.wordpress.com हे ब्लॉग
८) साद चाकोरीबाहेरील किल्ल्यांची -पांडुरंग पाटणकर

.jpg)

.jpg)



पाचनाईपासून इथपर्यंतचा प्रवास 'कधी काळी इथे डांबरी रस्ता होता का??' असा प्रश्न पाडणारा होता. डोंबिवलीतून निघाल्यापासून तब्बल ६-६.३० तासाची बाईकस्वारी संपवून, थोड काही पोटात टाकून, सकाळी ८.३० ला आम्ही आमचा ट्रेक सुरु केला.दहा-एक मिनिट दाट झाडीतून चालल्यावर आम्ही एका उघड्या कातळासमोर उभे होतो. या कातलातच कोरलेल्या पायऱ्या होत्या पण त्याना शेंदूर फासून ठेवल्यामुळे १-२ मिनिट आम्ही गोंधळून वाट शोधु लागलो. वाट या शेंदुरीच्या वरूनच डावीकडे होती, तिने सुमारे अर्ध्या तासाची उभी चढण पार करून आम्ही एका कातळ भिंतीसमोर.कातळात कोरलेल्या खोबण्यामध्ये जेमतेम पाय रोवत, हातांचा आधार घेत आणि नंतर समोर आलेला आडवा रॉक पॅच सांभाळून पार करत आम्ही पोहचलो एका चौकोनी जमिनीच्या खाली खोदलेल्या गुहेपाशी, भैरोबाची गुहा म्हणतात तिला. गुहेत शेंदूर फासलेला भैरोबा आणि बाहेर झिजलेले दोन सर्प शिल्प होते.
भैरोबाला हात जोडून, गुहेच्या डाव्या बाजूने अरुंद वाटेवरून चालत गेल्यावर दगडात खोदलेल्या आणि सध्या भंगलेल्या अवस्तेत असनाऱ्या टाक्या पाहून आम्ही पुढे निघालो.
गडाच्या त्याच टोकाला असलेली छोटीसी देवळी आणि तिसमोर ठेवलेले दोन गोल दगड त्या सुकलेल्या पिवळ्या गवतात उठून दिसत होते. हा होता 'वेताळाचा माळ'. या टोकावरून पाहिल्यावर समोर सह्याद्रीची बेलाग कडे डोळ्यांचे पारणे फेडत होते. परत थोड मागे येऊन, पाण्याच्या टाक्याकडून, सुकलेल गवत सांभाळून तुडवत आम्ही वर गडाच्या माथ्यावर पोहोचलो. इथे थोड दगडी बांधकाम दिसल जे बहुतेक गडावरील घराचं असाव. आता गडाच्या उजव्या बाजूला देखील तसेच रेखीव कडे लांबच लांब पसरलेले दिसत होते. हा सारा शिवसह्याद्रीचा पसारा डोळे भरून बघून आल्या वाटेने आम्ही गड उतरायला आम्ही सुरवात केली. वाटेत अजून एका ट्रेकरची भेट झाली व थोडया गप्पा झाल्या, मोबाईल नंबर एक्सचेंज झाले. पायथ्याला आम्ही जेव्हा पोहचलो तेव्हा १०.३० झाले होते. बाईक वर टांगा टाकून आम्ही आता निघालो भैरवगडच्या दिशेने.कलाडगड आणि त्याच स्थान पाहता, हे एक महत्वाच टेहळणीच ठाण असाव अस वाटत. पुर्वेला हरिश्चंद्रगड-तारामतीची रेंज आणि पश्चिमेला आजोबा पर्वत, कात्राबाईचा डोंगर, कुमशेतचा कोंबडा असा रांगडा सह्याद्री या गडाने वेढलेला आहे. हे सगळ पाहणाऱ्या एखाद्या भटक्याला हे कातळ, हिरवगार खोर जणू मोत्यासारखे वाटतिल, निळ्याक्षार आकाशाच्या धाग्यात गुंफलेले.
अकोले तालुक्याला अनेक निसर्ग संपन्न गडदुर्गांचा वारसा लाभलेला आहे.
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत कळसुबाईच्या सर्वोच्च शिखराबरोबरच रतनगड,
हरिश्चंद्र गड, विश्रामगड, भैरवगड, कुंजरगड आदी महत्त्वपूर्ण गड आहेत.
यांच्या सोबतीलाच मुळा खो-यावर आपली करडी नजर असलेला कलाडगड अगदी एकांतात
असला तरी त्याच्या सभोवताली असणारी निसर्ग सौंदर्याची खाण आणि आदिवासी
संस्कृती, जनजीवन आपल्या दृष्टीक्षेपात आणण्यासाठी आपण एकदा तरी या
किल्ल्याला भेट दिली पाहिजे.

या
गडाची सरासरी उंची ११०० मी. आहे. पाचनई या हरिश्चंद्र गडाच्या
पायथ्याजवळील गावातून दिसणारा परंतु पटकन लक्षात न येणारा असाच हा दुर्ग आज
मला खुणावत होता. पाचनईला लिंबू सरबत घेवून थोडीशी विचारपूस करून आम्ही
पेठेच्यावाडीकडे जाणा-या रस्त्याने आगेकूच केली. गडाच्या अगदी पायथ्याजवळून
आम्ही जात असताना नेमकी गडाकडे जाणारी वाट आम्हाला सापडली नाही. शेवटी
काही अंतर पुढे जावून आम्हाला परत फिरावे लागले. तिथे एक घोगरे नावाची
मावशी भात कापणीचे काम करत होती. तिला रस्ता विचारला असता, ती २०० मीटर
चालत…..आपले काम सोडून आम्हाला गडाकडे जाणारी वाट दाखविण्यासाठी आली.
आपल्या ठाकर समाजाच्या बोलीभाषेत तिने उत्कृष्टपणे रस्ता दाखविला. त्या
मावशीच्या त्या मार्गदर्शनाचा खरच खूप हेवा वाटला….आपल्या हातातले काम
सोडून इतके अंतर चालत ती आम्हाला रस्ता दाखविते….एका शहरी संस्कृतीला
लाजवेल अशीच हि माणुसकी मला त्या मावशीकडून शिकायला मिळाली.

पाचनईहे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास दीडतासामध्ये
चालत कलाडगडाच्या पायथ्याला आपणास पोहचता येते परंतु स्वताची गाडी असेल तर
अती उत्तम आणि लवकरच रस्ताही अतिशय चांगला होण्याची शक्यता आहे. कारण
सध्या येथे रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे.
कलाडगडाचाडोंगर एकांतात वसलेला डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्यामंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्वअंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसेकुंड
आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवत असेल असे सध्या त्या
कुंडातील पाण्याची सध्यस्थिती पाहून वाटते.. गडावर जाणारी वाटबर्यापैकी
मळलेली आहे. परंतु वनविभागाने गडावर जाणा-या वाटेच्या बाजूचे गवत कापलेले
असल्याने वाट शोधण्यास अडचण येत नाही. गडावरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी
स्थानिकगावकर्यांची
गडावर अधून मधून हजेरी असावी कारण गडावर विविध ठिकाणी नजीकच्या काळात
देव-देवतांना शेंदूर लावलेला दिसला.. घसार्याची वाट असल्याने काहीशीकाळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत.काही पायर्या चढून आपण गडावर प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५०मिनिटे लागतात. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे.पुर्वेकडील
भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. बाहेर नागोबा दैवत आहे.
त्यासमोर साकीरवाडीच्या गावक-यांनी बसवलेली एक तांब्याची मोठी घंटा आहे.
तिचा घंटानाद केला कि त्या आवाजात आतापर्यंतचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो
आणि आपण आजूबाजूच्या परिसरातले निसर्ग सौदर्य अनुभवत बसतो. भैरोबाला वंदनकरुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिमअंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्यपाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे.गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुनहरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्याघाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असाविस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही मनाला
मोहवून टाकते. गडावरून दिसणारे पेठ्याच्यावाडीचे दर्शनही खूपच मनोवेधक
दिसते. अशा प्रकारे कलाडगडाची आजची भटकंती करत असताना विशाल नाईकवाडी,
विठ्ठल गोरे, बापू पवार राहुल गहरवाल यांची सोबत मनाला दुर्गभ्रमंतीची
उर्जा देणारी ठरली.
/category/tribal-culture/%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97/
कलाडगड
4–5 minutes
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नगर
उंची : ३४७५ फुट
श्रेणी : कठीण
कलाड गड kladgad
अकोल्यापासून चे अंतर : 47.9 km.
अकोले हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम
भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटून असलेला अकोला तालुका
डोंगदर्यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्यामधे अनेक दुर्गम दुर्ग
असे गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत. याच दुर्गाच्या साखळीमध्ये साधल्या
घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या
खोर्यावर आपली करडी नजर ठेवणार कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.
पहाण्याची ठिकाणे :
गडाचा आकार पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे. पुर्वेकडील भागात कातळ गुहा
आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन करुन गडफेरीला निघावे. डावीकडे
कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम अंगाला जाता येते. डावीकडील
कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम
बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे. गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष
दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा
भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर,
आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी, घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड,
कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या
सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही मनाला मोहवून टाकते.
पाचनई हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून
तास दीडतासामध्ये चालत कालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या
पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक
लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावर पेठेची वाडी म्हणून लहानसे गाव
आहे.कलाडगडाचा डोंगर एकांड्या डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन
येणार्या मंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी
पुर्व अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे
लहानसे कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो.उन्हाळ्यामधे
मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट बर्यापैकी मळलेली आहे.
गडवरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक गावकर्यांची गडावर अधून मधून
हजेरी असते. घसार्याची वाट असल्याने काहीशी काळजी घेतच चढावे लागते. या
वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत. काही पायर्या चढून आपण
गडामधे प्रवेश करतो.
गाईड व संपर्क : 8390-607-203
कलाडगड : ट्रेकर्सकडून दुर्लक्षित गड (Kaladgad)
पंढरीची वारी वारकरी जशी नित्य नेमाने न चुकता पार पाडतात तशी
ट्रेकर्स त्यांच्या पंढरीच्या वारीला येतच असतात. वारकऱ्यांचा पांडुरंग हा
विठ्ठल रखुमाई असतात तर आम्हा दुर्ग वेड्यांचा तो हरिश्चंद्रगड! याच
हरिश्चंद्रगडाचा पाठीवरचा भाऊ म्हणून ओळख असलेला आणि तशाच प्रकारची दुर्गम
रचना असलेला हा कलाडगड होय.
किल्ल्याचे नाव- कलाडगड
समुद्रसपाटीपासुन ऊंची- ११०० मी
किल्ल्याचा प्रकार- गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी- मध्यम
ठिकाण- अकोले तालुक्यातील पाचनई गावातून पुढे आणि पेठेवाडीच्या अलीकडे
जिल्हा- अहमदनगर
सध्याची अवस्था- व्यवस्थित
भेटीची वेळ- वेळेचे बंधन नाही
किल्ल्याला भेट देताना-
हा गड थोडासा सवयीच्या ट्रेकर्सने करावा असा मी सल्ला देईल.
गडावर जाताना सोबतीला ४० फूट दोरी नक्की घेऊन जावी. तशी त्याची गरज
पडत नाही परंतु न होऊ पण काही घडले तर मदतीला उपयोगी असेल. गडावर
पावसाळ्यात तर मुळीच जाऊ नये, याचे कारण पुढे कळेलच आपल्याला.

हरीशचंद्रगडाच्या पाठीमागे वसलेला एक एकटा डोंगर म्हणजे कलाडगड
होय. आपल्या प्रवासात पाचनई गावात पोहोचल्यावर आपल्याला पश्चिम दिशेला
दिसणारा डोंगर म्हणजे कलाडगड! पाचनई गावातून प्रवासाला सुरुवात करायची( तशी
अकोले तालुक्यात आले की आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. त्यामुळे
अकोल्यात आले की राजूर पर्यंत जाईपर्यंत इतकं काही नवीन वाटत नाही पण एकदा
राजूर पासून पाचनई प्रवास सुरु झाला की मग माणसाच्या तोंडातून आपसूकच
आश्चर्य बाहेर पडत). पाचनई मधून एक कच्च्या रस्त्याने जवळपास दीड दोन
तासाच्या पायी पायपीटीनंतर आपण पेठेवाडीच्या अलीकडील शासनाने बांधलेल्या
एका सिमेंटच्या निवाऱ्याशेजारी येऊन पोहोचतो. इथूनच आपल्या गडावरील
प्रवासाला सुरुवात होणार आहे.हाच गडाचा पायथा. पाचनई पासून इथपर्यंत
पोहोचायला खाजगी वाहने किंवा स्वतःची वाहने आणता येतात. पाचनई मधून
कलाडगडासाठी सोबतीला वाटाड्या घेतला की तो मधल्या मार्गे फक्त १ तासात
तुम्हाला या ठिकाणी आणून पोहोच करतो.
किल्ला तसा ट्रेकर्स कडून दुर्लक्षितच आहे परंतु गडावरील
भैरवनाथाच मंदिर हे लोकांचे श्रध्दास्थान असल्याने पायवाट तशी रुळलेली
आहे.आपल्याला जर वाटाड्याने आणले असेल तर वाटेत निसर्गाचा मनमुराद आनंद घेत
आपल्याला ओढ्यांची, झाडांची आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाची सोबत नक्की
लाभेल. आता तुमच्या डाव्या हाताला जो डोंगर दिसतोय तो म्हणजे कलाडगड होय.
आता दाट झाडीमधून आपण प्रवासाला सुरुवात करायची, अर्ध्या तासाच्या
आल्हाददायक पण खड्या चढाई नंतर आपण येऊन पोहोचतो कातळकोरीव अशा दुसऱ्या
टप्प्याकडे.
दगडाला जागोजागी शेंदूर फासलेला आपल्याला दिसतो. इथून कातळात
कोरलेल्या काहीशा कठीण आणि काहीशा सोप्प्या अशा पायऱ्यांनी आपण पुढे चालत
राहायचं. पुढे कातळात कोरलेला एक अवघड टप्पा लागतो. इथे काळजी घेणे गरजेचे
आहे. या कातळात जेमतेम पाय कसाबसा बसेल इतक्याच जागेच्या खोबण्या केलेल्या
आहे. या खोबान्यांमध्ये हाताची मजबूत पकड बनवत हळूहळू पाय रुतवत तिरके
तिरके जात हा अवघड टप्पा पूर्ण करायचा.सोबत एकाच प्रशिक्षित ट्रेकर असेल तर
त्याने अगोदर वर जाऊन नंतर दोरीच्या सहाय्याने इतरांना सौरक्षण देत हा
टप्पा पार केला तर अति उत्तम.
हा टप्पा पार झाल्यावर आता गडाचा शेवटचा आणि काहीसा कठीण भाग
लागतो. इथे देखील कातळकोरीव पायऱ्या आहेत परंतु या अरुंद आहेत. ज्यांनी
यशस्वीपने मागचा टप्पा पूर्ण केला त्यांच्यासाठी हे जास्त अवघड नक्कीच
नाही. या मार्गाने आपण १० मिनिट मध्ये गडमाथ्यावर येऊन पोहोचायचे.
कलाडगडाच्या माथ्यावर पोहोचताच चहूबाजूने गगनाशी स्पर्धा करणारे
डोंगर, निरभ्र आकाश व हिरव्यागार वनराईने नटलेले व निळसर खळखळत वाहणारे
मुळा नदीचे खोरे पाहिल्यानंतर आपला चढाईचा थकवा कुठल्याकुठे पळून जातो.
गडाच्या माथ्याचा आकार लांबलचक असून आपण जेथे माथ्यावर पोहोचतो तिथेच
सुरुवातीला भैरवाची गुहा लागते.जमिनीखाली कातळात खोदलेल्या दगडात कोरलेले २ नाग शिल्प आपल्याला मंदिरात जागा नसल्याने
बाहेर गुहेसमोरच ठेवलेले दिसतात. हे भैरव मंदिर आजूबाजूच्या आदिवासी
लोकांचे श्रद्धास्थान असल्याने प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात इथे यात्रा
असते आणि त्यावेळेस शेजारी एक पिण्यायोग्य पाण्याचा झरा देखील असतो असे
गावकरी किंवा वाटाड्या आपल्याला सांगतो.
भैरवनाथाचे दर्शन करून किल्ल्याचा बालेकिल्ला उजव्या हाताला ठेवत
आणि दरी डाव्या हाताला ठेवत आपण गडाच्या दक्षिण भागाकडे जात राहायचे. वाट
तशी अवघड नाहीये परंतु अरुंद आहे आणि शेजारीच दरी असल्याने धोक्याची देखील
आहे.पुढे गेल्यावर या वाटेने तुम्हाला दोन पाण्याचे टाके लागतील. या
पाण्याच्या टाक्यांत दगड पडलेले आहेत व उपसा नाही त्यामुळे पाणी
पिण्यायोग्य नाहीये.टाके पाहून पुढे आपण एक सपाट माथ्यावर येऊन पोहोचतो.
येथे आपल्याला शेंदूर फसलेले दगड दिसतात. समोरच दोन गोलाकार अशी दगडे
दिसतात कदाचित ही तोफेची गोळे असावे असा माझा अंदाज. एक गोष्ट बरी केलीये
त्यांना शेंदूर लावून देवाचं रूप दिलंय त्यात हे वेताळाचे देऊळ त्यामुळे
कोणी हे दगड हलवण्याचा प्रयत्न नाही करत. ऐतिहासीक स्थळांवर सध्या जे
चाललंय त्यामुळे मनाला सतत दुःख होत, गडावर ठेवलेल्या तोफा किंवा तोफगोळे
पर्यटक मनोरंजन म्हणून दरीत ढकलून देतात. या गडावर देवाचे रूप देऊन का
होईना पण आजपर्यंत हे गोळे तसेच बघायला मिळताय ही एक आनंदाची बाब आहे. या
जागेला वेताळाचा चाळा असे म्हणतात.

ही जागा बघून आपण गडाच्या आणखी पिछाडीवर जायचे. रतनगडाचा खुट्टा
आपण बघितला त्याप्रमाणेच कलाडगडाला देखील असा एक सुळका आहे ज्याला कलाडचा
अंगठा असे म्हणतात. इथून निसर्गाचा आनंद घेऊन आपण गडाच्या बालेकिल्ल्याकडे
मार्गस्थ होण्यासाठी पाण्याच्या टाक्यांजवळ यायचं. गवतातून जाणाऱ्या
पायवाटेने आपण गडाचा बालेकिल्ला गाठायचा. बालेकिल्ल्यावर तसे बघण्यासारख्या
गोष्टी म्हणजे घरांचे जोते इतकंच. परंतु बालेकिल्ल्यावरून सह्याद्रीचा जो
आनंद घेता येतो तो बहुमूल्यच! मराठी मध्ये म्हणतात ना की तोडच नाही तसला
प्रकार हा.

उत्तरेपासून बघायला सुरुवात केली तर एक तुटलेल्या डोंगरासारखा भाग
दिसतो तो म्हणजे शिरपुंज्याचा भैरवगड, ज्या डोंगररांगेतून तो वेगळा झालाय
ते म्हणजे घनचक्करचे पठार किंवा डोंगररांग, मागच्या बाजूला दिसतोय तो रतनगड
आणि मुळा नदीचा आनंद आपण घेतला तिचे उगमस्थान असणारा आजोबा पर्वत आणि
सोबतीला कात्राबाई चा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो.
आता जसे जसे दक्षिण पूर्वेकडे सरकतोय तसे आपल्याला कोथळयाचा
भैरवगड आणि कुंजरगड काहीसा दिसतो.पुढे आपल्याला कुमशेतचा कोंबडा हा डोंगर
आणि कलाडगडाचा नाफ्ता नजरेस पडतो. दूरवरपसरलेला माळशेज घाट आणि कोकणात
उतरणाऱ्या त्याच्या पर्वत शृंखला धुके नसेल तर बघायला मिळतात. पूर्वेला
आपल्याला दिसतो तो आपल्यासारख्यांसाठी असलेले पंढरपूर, म्हणजे
हरिश्चंद्रगड!
गडाचा प्रवास आपला इथेच संपतो त्यामुळे खाली उतरताना आपण काळजी घ्यावी आणि दोरीच्या साहाय्याने उतरले तर आपली काळजी कमी होईल.
आपण रतनगडाच्या भागात जस सांगितलं त्याप्रमाणे रतनगड करून तुम्ही
कलाडगड आणि परत पाचनई मध्ये येऊन हरीशचंद्रगड असा मार्ग अवलंबु शकता. किंवा
हरिश्चंद्रगड करून मग कलाडगड आणि मग पुढे भैरवगड करून कुंजरगड असा ४
दिवसांचा ट्रेक देखील करु शकता.

कलाडगडाचा इतिहास-
कलाडगडाची तशी इतिहासात नोंद नाहीये परंतु जसा हरिश्चंद्रगड
बांधला त्याप्रमाणे आणि तेव्हाच कलाडगड देखील बांधला असावा असा अंदाज आहे.
असे बोलण्याचे कारण म्हणजे आज्ञापत्रात म्हणाल्या प्रमाणे गडाशेजारी जर
दुसरा डोंगर असेल तर तो समूळ फोडून नष्ट करावा आणि ते शक्य नसेल तर तो
देखील बांधून काढावा. कातळात तयार झालेला हा डोंगर फोडून काढणे शक्य नव्हते
त्यामळे कदाचित याला बांधून काढले असावे.तसे युद्ध इथे झाले नसावे आणि या
गडाचा उपयोग हा टेहाळणी साठी केला असावा असे वाटते.
राहण्याची व खाण्याची व्यवस्था-
गडाच्या पायथ्यापासून ५ कि. मी. अंतरावर पाचनई गावात हनुमानाच्या
मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते आणि जेवणाची व्यवस्था तेथील काही हॉटेल्स
मध्ये होऊ शकेल.
 |
 |
| |
| North west view from Kaladgad, featuring Muda and Katrabaai pass.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| North east view from Kaladgad, featuring Ghanachakkar range.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| South view from Kaladgad, featuring Nhapta pinnacles.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| South east view from Kaladgad, featuring Harishchandragad.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| South view from Kaladgad, featuring Nhapta pinnacles.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| Deity at south end of Kaladgad.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| Bhairoba Deity at Kaladgad cave temple.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| Sculpture at Bhairoba cave temple.
|
| |
|
|
| |
 |
 |
| |
| Bhairoba at Kaladgad cave temple
|
| |
|
|
| |
|
| |
| Bhairoba, Kaladgad
|
| |
 |
| |
| Deity paat at Pethechi wadi.
|
| |
| |
अहमदनगर जिल्ह्यात, हरिश्चंद्रगडाजवळ असलेल्या कलाडगडाची उंची समुद्रसपाटीपासुन ११५० मीटर आहे. डोंगराचे २ भाग आहेत. मुख्य भागात भैरोबाचे देवस्थान आहे. डोंगराच्या दुसऱ्या भागात लहान सुळके आहेत. गडाच्या उत्तरेला पेठेची वाडी गाव आहे. मुळा नदीच्या तीरावर वसलेले हे गाव, समुद्रसपाटीपासुन ८६० मीटर उंचीवर आहे. लव्हाळी-पाचनई-पेठेचीवाडी हा रस्ता या गावात येउन थांबतो. गावात ठाकर समाजाची वस्ती असुन येथे २ लहान देवळे आहेत. मरिआई व भैरोबाच्या या देवळात पाट आहेत. लाकडी पाटांवर देवाच्या पट्ट्या आहेत. नक्षीकाम आहे. देवळाबाहेर तुती (मलबेरी) चे झाड आहे. पावसाळ्यानंतर झाडावर लाल काळी फळे असतात. गडाचा पायथा गावापासुन अंदाजे १ कि मी आहे. गडावर पोहोचण्यास अंदाजे २००-२२५ मीटर चढावे लागते. वरच्या भागात कातळात पायऱ्या असुन, येथे आधार कमी आहे. (पावसाळ्यात धोकादायक). माथ्याच्या थोडे खाली कोपऱ्यावर भैरोबाची गुहा आहे. गुहेत भैरोबा आहे. त्याच्या डावीकडे दिव्याचा स्तंभ असुन, समोर शिळा आहे. शेंदुर फासल्यामुळे शिळेवरचे कोरिवकाम अस्पष्ट झाले आहे. गुहेत कमालीचा गारवा असतो. गुहेला भेगा असुन त्यात पाणी ठिबकते. गुहेबाहेर सर्प शिल्पे आहेत. कातळालगत कड्याच्या बाजुने वाट दक्षिण टोकाकडे जाते. येथे मोकळ्यावर पाण्याच्या टाक्या, बांधकामाचे अवशेष आहेत. लहान माळावर देवाचे दगड आहेत. गावकरी इच्छा मनात धरुन दगड उचलतात. वरवर अंधश्रद्धा वाटत असली तरी हा प्रकार म्हणजे मनात गाठ मारण्याचा एक प्रकार आहे. गडाच्या दक्षिण टोकावरुन बाजुला सुळका दिसतो. पल्याड न्हाप्ता, व पुर्वेकडे हरिश्चंद्राची शिखरे दिसतात. पश्चिमेला साधळे घाट, व उत्तरेस आजोबा-घनचक्कर रांग दिसते. दक्षिणेला माळशेज रांग पुसट दिसते. धुके व धुरामुळे हा भाग स्पष्ट दिसणे अवघड आहे.
किल्ले कलाडगड
- प्रमोद मांडे
अकोले
हा तालूका अहमदनगर जिल्हामध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम
भागामध्ये असलेल्या सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लगटून असलेला अकोला तालुका
डोंगदर्यामुळे निसर्ग संपन्न आहे. या डोंगर दर्यामधे अनेक दुर्गम दुर्ग
असे गिरीदुर्ग ठाण मांडून बसलेले आहेत.
याच
दुर्गाच्या साखळीमध्ये साधल्या घाटाच्या माथ्यावर कालाडगड नावाचा
दुर्लक्षीत दुर्ग उभा आहे. मुळा नदीच्या खोर्यावर आपली करडी नजर ठेवणार
कलाडगड स.स.११०० मी. उंच आहे.
कलाडगड
पोहोचण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. कलाडगडाच्या पायथ्याला पोहोचण्यासाठी
अगोदर पाचनई हे लहानसे गाव गाठणे सोयीचे ठरते. या पाचनईस येण्यासाठी अकोले
तालुक्यामधील राजूर हे गाव सोयीचे आहे. राजूरवरून काही ठराविक एस.टी.बसेस
पाचनई पर्यंत येत असतात.
पुणे
जिल्ह्यामधील माळशेज घाटाच्या माथ्यावर खिरेश्वर नावाचे गाव आहे. खिरेश्वर
हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव आहे. येथून टोलार खिंडीमार्गे साधारण ४
तासांची पायपिट करीत पाचनई गाठता येईल. अथवा हरिश्चंद्रगडाला भेट देऊन
हरिश्चंद्रश्वर मंदिराच्या परिसरातून तासाभरामध्ये डोंगर उतरुन पाचनईला
येता येते.
पाचनई
हे गाव हरिश्चंद्रगडाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेले आहे. येथून तास
दीडतासामध्ये चालत कालडगडाच्या पायथ्याला आपण पोहोचतो. कलाडगडाच्या
पूर्वेकडून गडावर जाणारा मार्ग आहे. कलाडगडाच्या पायथ्यापासून जवळ एक
लहानशी वस्ती आहे. तेथून पुढे अर्ध्यातासावर पेठेची वाडी म्हणून लहानसे गाव
आहे.
कलाडगडाचा
डोंगर एकांड्या डोंगर आहे. मुळानदी आणि हरिश्चंद्रगडावरुन येणार्या
मंगळगंगा या नद्याच्या बेचक्यात कलाडगड उभा आहे. गडावर चढणारी पुर्व
अंगाच्या वाटेशिवाय दुसरी वाट नाही. गडाच्या पायथ्याशी पाण्याचे लहानसे
कुंड आहे. उन्हाळ्यामधे मात्र पाण्याचा तुटवडा जाणवतो. गडावर जाणारी वाट
बर्यापैकी मळलेली आहे. गडवरच्या भैरोबाला नमन करण्यासाठी स्थानिक
गावकर्यांची गडावर अधून मधून हजेरी असते. घसार्याची वाट असल्याने काहीशी
काळजी घेतच चढावे लागते. या वाटेवर काही कातळात कोरलेल्या खोबण्याही आहेत.
काही पायर्या चढून आपण गडामधे प्रवेश करतो. पायथ्यापासून साधारण ४० ते ५०
मिनिटे लागतात. गडाचा आकार लालुंळका आहे. तो पुर्व-पश्चिम असा पसरलेला आहे.
पुर्वेकडील भागात कातळ गुहा आहे. या गुहेमधे भैरोबा आहे. भैरोबाला वंदन
करुन गडफेरीला निघावे. डावीकडे कडा व उजवीकडे माथा ठेवून गडाच्या पश्चिम
अंगाला जाता येते. डावीकडील कड्यावर तटबंदी आहे. वाटेत पिण्यायोग्य
पाण्याची टाकी आहेत. गडाच्या पश्चिम बाजूला एक अंगठ्यासारखा सुळका आहे.
गडावर गडपणाचे काही तुरळक अवशेष दिसतात. कलाडगडाच्या माथ्यावरुन
हरिश्चंद्रगड, माळशेज घाट, मोरोशीचा भैरवगड, नानाचा अंगठा, साधल्या
घाटाजवळचा नकटा डोंगर, कोंबडा डोंगर, आजोबाचा भव्य डोंगर, कुमशेतची लिंगी,
घनचक्करचे पठार, घनचक्कर भैरवगड, कुंजरगड तसेच कोथळ्याचा भैरवगड असा
विस्तृत प्रदेश दिसतो. या डोंगराच्या सौंदर्याबरोबरच त्याचे रौद्रत्वही
मनाला मोहवून टाकते.
पाचनईमधला
रविवार उजाडला तोच मुळी डोळ्यासमोर कलाडगडाची दृश्य घेऊन !! पाचनईमधल्या
बादड,भारमलांच्या अंगणात गाड्यांची संख्या वाढू लागली. हरिश्चंद्रावर आजही
"जत्रा" भरणार ह्याचा हा पुरावा. आम्ही मात्र त्या पुरात वाहून जाणार
नव्हतो ह्या विचारानेच सुखावलो. तुकारामच्या अंगणातूनच उत्तरेकडे कलाडगड
आणि न्हाप्त्याची दुक्कल नजरेस पडत होती…धडकी भरवत होती. "जाताना ती पाप -
पुण्याची कुंड बघून या बरं का !!" इति तुकाराम. पाप पुण्याची कुंड ?? असेल
बुवा !!
पाचनई - पेठेची वाडी रस्त्यावरून कलाडगड आणि त्याचा अंगठा. कलाडच्या उजव्या सोंडेवरून गडावर जायला पायवाट आहे
पाचनईमधून कलाडगड पायथ्याच्या पेठेच्या
वाडी कडे नेणारा नऊ किलोमीटर्सचा डांबरी रस्ता हळूहळू घाटाची वळणं चढू
लागला. पण स्वत:चं वाहन असेल तर कलाडगड चढण्यासाठी पेठेच्या वाडीत
जाण्याची काहीच गरज नाही. पेठेच्या वाडीकडे जाताना रस्त्याच्या मधूनच एका
झाडाखालून गडाची प्रशस्त पायवाट गेली आहे. पण स्थानिक माणूस सोबत नसेल तर
ही सुरुवात सापडणं केवळ अशक्य !!! तुकारामचे सासरेच आम्हाला मार्गदर्शक
म्हणून लाभल्याने आम्हाला ही सुरुवात झटकन सापडली. कलाडगडाची चढण
प्रशस्त,सोपी तरीही अत्यंत खडी व काही ठिकाणी घसरगुंडी उडवणारी !!
जाताना
वाटेत गडाच्या पाय-यांनाच शेंदूर फासून त्यांना देवपण देण्याचा प्रयत्न
केला आहे !! पाय-याच त्या. त्यांच्यावर पाय ठेवून जायचं कसं ह्या प्रश्नाला
आमच्याकडे मात्र उत्तर नव्हतं !! तास - सव्वा तासात गडाच्या भक्कम
पाय-यांना सुरुवात झाली.
गडाच्या वाढत्या उंचीबरोबर आजूबाजूचा
प्रदेशही नजरेत भरू लागला. पाठीमागचे सिंदोळा पर्वत,घनचक्कर,शिरपुंज्याचा
भैरवगड आणि पाबरगड ह्यांच्या भव्यतेमुळे अंगावर मूठभर मांस चढलं !!
शेवटच्या टप्प्यात कलाडच्या कातळात
खोदलेल्या अरुंद अशा खोदीव पावट्यांचा जिनाच आहे. तिरक्या रेषेत त्या वर
सरकल्याने आणि खाली शेकडो फुट दरी आ वासून उभी असल्याने क्षणभर काळजाचे
ठोके चुकले आणि "होल्ड" वरची पकड थरथरली. पण सह्याद्रीच्या ह्या
वैशिष्ट्याला स्मरून हा जरासा कठीण टप्पाही लीलया पार झाला आणि अखेरीस
आम्ही कलाडगड माथ्यावर प्रवेशलो. माथ्यावर पाऊल ठेवताचक्षणी उजवीकडे
भैरोबाचं गुहावजा स्थान आहे. आमच्या ह्या भटकंतीतला हा तिसरा
भैरोबा…आधीच्या दोघांप्रमाणे अनगड जागी वसलेला !!! काही भक्तांचं गा-हाणं
ऐकायला तर काहींच्या धन्यवादाचा स्वीकार करायला !! आमच्याबरोबर असलेले
पाचनईचे भारमल मामा सुद्धा अशाच निस्सीम भक्तांपैकी एक. ते ह्या भैरोबाच्या
दर्शनासाठी कलाडगडाच्या वाटेवरच्या पायाला बोचणा-या
दगडगोट्यातून,काट्याकुट्यातून आणि तापलेल्या कातळावरून…अनवाणीच आले होते
!!!
कलाडगडचा सर्वोच्च माथा उजवीकडे ठेवत आणि
डावीकडच्या खोल दरीचा मान राखत अरुंद निसरड्या पायवाटेने आम्ही आता गडाच्या
पश्चिमेकडे धावत गेलेल्या सोंडेवर पोहोचलो. स्वागतासाठी सुरुवातीलाच
थंडगार पाण्याचं टाकं !!! चव…निर्विवादपणे अप्रतिम.

ह्याच सोंडेवर पुढे एक छोटीशी घुमटी अन
त्याच्यासमोर शेंदूर फासलेले दगड आहेत. त्यांना दंडवत घालून आम्ही आता
कलाडगडाच्या सोंडेच्या शेवटी पोहोचलो. स्वर्गानुभूती !!!

कलाडच्या माथ्यावरून दिसणा-या
सह्याद्रीच्या रूपाचं कवतिक कोणत्या शब्दात करावं !!! सह्याद्री नावाच्या
जादुगाराने अगदी "फुरसत में" तयार केलेला हा प्रदेश. ३६० अंशातलं बेभान
दृश्य वेड लावून गेलं !!! अजस्त्र,राकट,रौद्र,भीषण,अफाट,बुलंद,बेलाग…आता
शब्दच सुचत नाहीयेत. ईशान्येकडे सिंदोळा डोंगर,घनचक्कर,शिरपुंज्याचा
भैरवगड,पाबरगड त्याच्याच पुढे उत्तरेकडे कात्राकडा,करंडा,गुहीरीचे
दार,आजोबा,पाथरा घाट,खाली कुमशेत गाव,वाकडी सुळका,बुधला,माळ
डोंगर,वायव्येकडे कुमशेतचा कोंबडा,न्हाप्ता आणि पश्चिमेकडे हरिश्चंद्रगडाचं
एकेक अंग….बालेकिल्ला,तारामती शिखर,टोलारखिंड,वेताळधार,रोहिदास शिखर,सादडे
घाट,त्यापाठीमागे भोजगिरी,दौंड्या आणि अस्पष्ट दिसणारा निमगिरी !!! कलाडला
खेटून शिवपिंडीसमोर बसलेल्या नंदिप्रमाणे दिसणारा कलाडचा अंगठा आणि
कलाडच्या उत्तर पायथ्याचं टुमदार पेठेची वाडी गाव !!!! आहहा…डोळ्यांसाठी
जणू सह्याद्रीने पेश केलेली मेजवानीच. आमचा जवळपास अर्धा तास नि:शब्द
अवस्थेत गेला हे आम्ही त्या सह्यविश्वात हरवल्याचं मूर्तिमंत उदाहरण !!!!
कलाडच्या माथ्यावर ना बुरुज,ना तटबंदी,ना
दरवाजे,ना कोणा अनाम गडक-याचे जोते….थोडक्यात कोणतंही गडपण नाही !!! पण
माथ्यावरून दिसणारं सह्याद्रीचं वेगळेपण मात्र शब्दांच्या….विचारांच्या आणि
भावनांच्या परिसीमा ओलांडून जाणारं !!! बघताचक्षणी भावणारं आणि चिरकाल
स्मरणात राहणारं !!! आजही हे वर्णन करताना ते दृश्य जसंच्या तसं डोळ्यासमोर
उभं राहिलंय….आत्ताही अंगावर शहारा आणतंय !!!
पाचनईमध्ये परतलो तेच मुळी सह्याद्रीचे नजारे डोळ्यात साठवत. तुकारामच्या पडवीमध्ये अक्षरश: सांडलो तेव्हा उन्हाचा तडाखा वाढला. पण सह्याद्रीच्या अभूतपूर्व नजा-यांनी मनाची
सगळी मरगळ घालवून पुन्हा एकदा तजेला दिला. तुकारामच्या अंगणात एकीकडे जेवण
शिजत होतं तर दुसरीकडे गप्पांना उत आला. निरोपाच्या काही गळाभेटी कलाडगड
पायथ्यालाच झाल्या तर काही हरिश्चंद्राच्या कड्यांनी अनुभवल्या. वाहनांचे
मार्ग वेगळे झाले पण दोन दिवसात मनांचे मार्ग मात्र जुळले होते !! आधीच्या
सह्यमेळाव्याच्या आठवणी जागल्या,ह्या मेळाव्यावर साधक - बाधक चर्चा…."विशेष कामगिरीचे" कौतुकसमारंभही पार पडले आणि पुढच्या मेळाव्याची स्थाननिश्चिती कुठेतरी भटक्यांच्या नकाशावर आकार घेऊ लागली !!!
मुळा
नदीचे पात्र ओलांडून(उन्हाळा असल्याने नदीला पाणी कमी असते) चालत पेठेच्या
वाडीला गेले व उरले-सुरले १७ जण गाडीतून पेठेच्या वाडीला पोहोचलो..बरीच
रात्र झाली होती..आमची गाडी पेठेच्या वाडी ला होती. पेठेची
वाडी-पाचनइ-राजूर-कुमशेत असा वळसा मारून गाडीला यावे लागणार होते.. रात्री
पेठेच्या वाडी ला पोहोचलो आणि मटकी ची उसळ, पुरणपोळी चा बेत जेवलो.. आता
हरिश्चंद्र आम्हाला वेळेअभावी जमणार नाही हे कळून चुकले. आज पाहिलेला
भलामोठा आजोबा स्वप्नात आला नसता तरच नवल!!!!
 |
| रतनगड नेढ्यातून आजूबाजूचा परिसर |
दिवस तिसरा..
आता
आज आम्ही कलाडगड करून सादडे घाट उतरून केळेवाडी ला पोहोचणार होतो..
ठरल्याप्रमाणे तासाभरात आम्ही कलाडगडा वर पोहोचलो.. वाटेत किंचित कठीण
स्वरूपाचा कातळटप्पा पार करत माथ्यावर पोहोचलो. कलाडच्या भैरोबाचे दर्शन
घेतले.
 |
| कलाडगड |
कलाडगडावरून
नाफ्ता, निमगिरी, रोहिदास, नाणेघाट, जीवधन, ढाकोबा, मोरोशी चा
भैरवगड,वानरलिंगी, वर्हाडाचा डोंगर, हरिश्चंद्र चा बालेकिल्ला असा परिसर
न्याहाळला व खाली उतरलो..
आता शेवटचा ६-७ तासांचा सादडे घाटाचा टप्पा उरला होता.. पेठेच्या वाडीतून १.३० तास चालल्यावर सादडे घाटाच्या मुखाशी येउन पोहोचलो
 |
| बैल घाट हरिश्चंद्र गड |
तोल
सांभाळत सगळे हळू हळू खाली उतरू लागले..घाटाचा तीव्र उतार व बारीक खडी हि
आता पायाचा निकाल लावत होती त्यात वरून सूर्यदेव आग ओकत होता..
सगळ्यांची
पायाची बोट आता शिजून निघाली होती.. सावली आली कि हायसे वाटायचे..त्यात
पाठीवर वजन..असा सगळा राडारोडा सांभाळत आमचा गोतावळा ५ वाजता केळेवाडीत
येउन पोहोचलो.. समोरच रोहिदास, कोकणकडा तर डावीकडे नाफ्ता ताठ मानेने उभे
होते.
 |
| नाफ्ता |
असा
एकंदर अवघड ट्रेक एकूण ३२ पुणे-मुंबईकरांने मोठ्या जिद्दीने पार
पाडला..केळेवाडी मधून आम्ही जेवयला एका नदीच्या आडोश्याला गेलो.. नदीमध्ये
पोहायचा मोह मात्र कुणालाही आवरला नाही.
No comments:
Post a Comment