फोफसंडी गावाकडून :-
फोफसंडी हे एन डोंगराच्या गाभ्यात वसलेले दुर्गम गाव. मात्र समाजमाध्यमाच्या कृपेने या गावाची ओळख बहुतेकांना झाली ते 'सर्वात कमी सुर्यप्रकाश असलेले गाव' म्हणून.फोफसंडी गावाजवळ देवनाळ धबधबा, घरीचा धबधबा, टाकोरी धबधबा, पिनाकी धबधबा हे पावसाळी धबधबे आहेत.फोफसंडी गावात फोफसंडी टुरिझम , हॉटेल कुंजरगड अशी हॉटेल आहेत.
फोफसंडी गावाला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) फोफसंडी गावात पोहोचण्यासाठी मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट - खिरेश्वर गाठावे. खिरेश्वरच्या पुढे फोफसंडी गावाला जाणारा फाटा आहे. फोफसंडी गाव डोंगररांगेच्या माथ्यावर असलेल्या पठारी भागात असुन फोफसंडीला पोहोचण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते.
कोपरे ते फोफसंडी हा रस्ता पुर्णपणे वनविभागाच्या अख्यरित असल्याने मंजुरी मिळणं अवघड झाले आहे. कोपरे पुणे जिल्ह्यात तर फोफसंडी नगर जिल्ह्यात. वाटेत लागलेला तो देवनाळ्याचा पूल ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा. जर पक्का रस्ता झाला तर कोपरे ओतुर मार्गे इथून माळशेज घाट अगदी जवळ होईल..असो.

फोफसंडी हे अतिशय दुर्गम असे चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले दर्या खोर्यात वसलेले १०००-१२०० लोकवस्तीचे लहानसे गाव. अशा या भौगोलिक स्थानामुळे इथे सुर्योदय काहीसा उशिरा तर सूर्यास्त लवकर होतो. पावसाळी शेती त्यात तांदूळ, नाचणी, वरई तसेच हिरडा सारख्या वनस्पतीची विक्री आणि जोडीला थोडे फार पशूधन हेच काय उपजीविकेचे साधणं. या भागातील बघण्यालायक ठिकाण म्हणजे फोफसंडीचे कुलदैवत दर्याबाई मंदीर. गावापासून ४ किमी अंतरावर असलेले राणुबाई मंदिर त्याच्या आसपास मोठ मोठ्या गुहा. तसेच रानात वसलेले ग्रामदैवत कळमजाई मंदीर. ज्यावरुन नदीला नाव पडले त्या मांडवी हृषिनी तप केले ती घोडगडद नावाची गुहा. घारीचा, धुळगडीचा, कावडाच्या, भदभड्याचा इ अनेक लहान मोठे धबधबे. चारण गडद, गहीन्याची गडद इ अनेक मोठ मोठ्या गुहा. इथे एका गुहेत मांडव्य ऋषीनी तपस्या केली आणि एक नदी अवतरली.. ती मांडवी नदी इथे उगम पावते..खरचं हे सारं पहायच असेल तर पायगाडीला पर्याय नाही, प्रत्येक ठिकाण पाऊण ते तासभराच्या अंतरावर टप्पा टप्प्यांत केलेला छोटा ट्रेकच. या साठी तीन चार दिवसांची सवड काढून फोफसंडीला जायला हवे.
गावच्या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे. साधारण १९२५ च्या सुमारास संगमनेर प्रांतचे इंग्रज अधिकारी मपोपफ हे घोड्यावर फिरत फिरत अनेक लहान मोठे डोंगर पार करुन या दरीत उतरले. त्या वेळी होती तुरळक आदिवासी वस्ती. पोप साहेबाला इथला निसर्ग खुप आवडला. इतका की तो दर रविवारी इथे येऊ लागला. या भागात उगम पावणारी मांडवी नदी जिच्यावर आता चिल्हेवाडी धरण बांधण्यात आले आहे त्या नदी तिरावरील टेकडीवर रेस्ट हाऊस बांधले. तिथून तो इथल्या डोंगर रांगा कुंजरगड, पावसाळ्यात डोळ्यांचं पारण फेडणारे रूप अनेक धबधबे पाहत असे. पोपच्या रहण्याने या गावला मपोफसंडी म्हणू लागले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रुढ झाले.
गाव तसे सुविधा पासून वंचित. रस्ते, वीज, शाळा यांची वानवा. शिकायला दूर आश्रम शाळेत. २००४-५ नंतर वीज व रस्ते आले. त्यात ही स्थानिक मंडळी यांचे सहभाग व श्रमदान महत्वाचं. दत्तात्रय मुठेनी त्या साठी शासन दरबारी बरीच पायपीट केली. सध्या गावात अकोलेहून सायंकाळी मुक्कामी एस्टी येते. लवकरच दहावी पर्यंत शाळा होणार. आरोग्य सुविधा तसेच शेतीला पुरक व्यवस्था व पर्यटनावर भार द्यायचा त्यांचा मानस आहे.

फोफसंडी गावातून कुंजरगडावर चढणारी वाट सोपी आणि साधारण १ ते १.३० तासांची आहे. गावातून गड दिसत नाही, तो एका टेकडाच्या मागे आहे. भाताच्या, वालाच्या मळ्यांतून आणि उतारावर लावलेल्या नाचणीतून वाट काढत निघालो कि समोरच्या डोंगरावर किल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी स्पष्टपणे दिसायला लागते. गडाची तटबंदी समोर दिसत असली तरी माथ्यावर चढणारी वाट फिरुन जाते. अर्थात वेळ वाचावायचा असल्यास आणि पुरेसा आत्मविश्वास असल्यास तटबंदीला लागून असणारा कातळटप्पा चढून जाता येते. मात्र असे कडे चढण्याचा सराव असणे आवश्यक आहे. तटबंदी नजरेसमोर ठेवून चाल सुरु ठेवायची. इथून एक टेकडी पार करून एका पठारावर येतो. एका झाडाखाली एक थडगे होते आणि त्यावर भगवा झेंडा दिसतो. या पठारावरून उजवीकडून वाट फिरून गडाच्या प्रवेशद्वारापाशी जाते.


गडाच्या माथ्यावरुन हडसर, निमगिरी, सिंदोळा, हरिश्चंद्रगड, कलाडगड, आजोबा, घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांग दिसते. येथुन अहमदनगरच्या राकट, उंच कातळकडे असलेल्या डोंगर रांगांचे दर्शन होते. आपल्या नाकासमोर तारामती आणि हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला बघताना वेगळीच मजा येते. तसेच समोर घनचक्कर, गवळदेवची डोंगररांग दिसते.

येथून प्रवेशव्दारापाशी परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. गडावर शक्यतो पाणी नसते त्यामुळे इथे कॅम्पिंग चा विचार स्वताच्या जबाबदारीवर घ्यावा. किल्ल्याचा दक्षिण बुरुज तुटलेला आहे, त्यातून एक वाट खाली उतरते. थोडं खाली उतरल्यावर छोटासा रॉक पॅच आहे. तो उतरून किल्ल्याच्या दक्षिण खिंडीकडे जाऊ लागले कि खाली खिंडीकडे एक कबर दिसते. कबरीकडे उतरून उजवीकडे खिंडीकडे प्रस्थान करायचे..गडाच्या दक्षिण खिंडीत आलो कि खाली गावाकडे वाट उतरते. वाट एकाच उंचीवरून सरळ चालते. खिंड आपल्या पाठी असते. सावलीचा भाग संपतो आणि वाट थोडी उतरू लागते. विहीर गाव अगदी उजव्या हाताला आल्यावर ती सोंड सोडून गावाकडे उतरू लागायचे कि अर्ध्या तासात विहीर गावात.
कारकाई
गावाची आश्रमशाळा सोडून शेतीवरील बांधावरून चालू पडलो. वाटेत काही मुलं खेळताना दिसली त्यांना विचारत वाटेची खात्री करून घेतली. टोलार खिंडीला डावीकडे ठेवत समोरच्या महाकाय डोंगराची दिशा धरली. सुरूवातीस वाट झक्क मळलेली नंतर एका टेकडीला वळसा घालून आतल्या बाजूने वर चढू लागली. आधी वाटलं हि टेकडी चढून पदरात जाऊ मग विरूद्ध बाजूला असलेल्या मुख्य धारेवर येऊ. काही मिनिटातच दोघं तिघं गवताचे भारे वाहून आणताना भेटले. त्यांनी तर कारकाई ला इकडून वाट नाही अस स्पष्ट सांगून टाकले. हि लोकं आतल्या बाजूस लाकूडफाटा गोळा करायला जातात, तसेच टेकडीच्या माथ्यावर जनावरं घेऊन. माघारी वळून मुख्य ओढा पार करून पलीकडील बाजूस गेलो. एक अस्पष्टशी वाट धरली आत खोलवर जंगलात शिरत ती वाट काही चढाईला लागेना. दिशेप्रमाणे उजवीकडे कारवीच्या रानात घुसखोरी केली. ते पार करत मग ठिसूळ बारीक दगडगोटे तीव्र चढाई त्यात स्क्री.
काही मिनिटातच त्या गचपणातून बाहेर येत आडव्या अरुंद अशा ट्रेव्हर्स वर आलो. आता समोरच्या बाजूस उजवीकडे होती ती कारकाई ची वाट त्याच वाटेला काहीजण खराड असेही म्हणतात. पंचेचाळीस अंशाहून अधिक तीव्र कोनात असलेली अरूंद वाट पार करून पदरात दाखल झालो. थोडं उजव डावं करत मुख्य वाटेवर आलो. काही अंतर जाताच दोघेजण दिसले विचारपूस केल्यावर कळले की कारकाई ला खिरेश्वर हून सहसा कुणी जात नाहीत, हि मुख्य वाट कोल्हेवाडीतून येते. साधारण अर्धा पाऊण तास दाट जंगलातून चाल, तांबट चा कुटर कुक तर अधून मधून कानी पडणारा शिळकरी कस्तुर. पदरातील वाट थेट कड्याला चिकटून बाहेर आली. खाली पाहिलं तर आम्ही बरीच ऊंची गाठली होती. पिंपळगाव जोगा धरणाचा निळाशार फुगवटा, खिरेश्वर आसपासच्या वाड्या वस्त्या तर समोर डोंगराचे कातळकडे नजर थेट टोलारच्या दिशेने जात हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्यातच.
उजवीकडे कडा तर डावीकडे दरी अशी अरूंद वाट तिरक्या रेषेत चढाई. अधे मध्ये पिवळीधम्मक गवताची पाती. वीसेक मिनिटातच मुख्य नाळेत आलो याच वाटेला खराड दरा असे म्हणतात. सुरूवातीस बऱ्यापैकी रूंद असलेल्या नाळेत फार अशी झाडं नाहीच. तुरळक कारवी, कुठे खुरटी झुडपं तर मध्येच एखाद दुसरं ऊंबराचे झाडं, भर उन्हात तेच काय सावलीचे ठिकाण. नेहमीप्रमाणेच जसजसे वर जाऊ लागलो नाव अरूंद होत आजूबाजूचे कडे चांगलेच भेदक वाटू लागले. शेवटच्या टप्प्यातील दगडांचा खच आणि भयंकर घसारा दोन तीन पावलं वर गेलं तर एखादा पाऊल खाली येणारच. डावं उजवं करत कड्याचा आधार घेत अस्तेकदम वर पोहचलो.
फार सपाट नसलेल्या ऊंच सखल माथ्यावर गवताळ पठारावरून आजूबाजूचा बराच प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेस वारल्याची टेकडी, निरोळी कडील बाजू. पश्चिमेला पिंपळगाव जोगा जलाशया मागे उधळ्या, सिंदोळा, भोजगिरी कडील बाजू तर उत्तरेला हरिश्चंद्रगडाचा पसारा. अर्थात वातावरण धुसर असल्याने फार अजून काही पाहता आलं नाही.
मळलेली एक वाट घेतली त्यानुसार साधारण हरिश्चंद्र दिशेने निघालो.साधना तर आधी म्हणत होती असेच जाऊ व टोलार खिंडीत उतरू. हे म्हणायला जरी सोपं असलं तरी हा कारकाईचा डोंगर जो हरिश्चंद्रगडाचा शेजारी जरी असला तरी तो टोलारच्या दिशेला टप्पा टप्प्यात टेकडीने जोडला आहे. सहाजिकच खिंड व काहीशी अवघड चढाई उतराई. वाट एका ठिकाणी कोरड्या ओढ्यात उतरत नाहिशी झाली. आम्ही तसेच पुढे उजवीकडे दरीच्या काठावर जाऊन पाहिलं तर खाली डाव्या बाजूला बर्यापैकी दूरवर भैरोबा दुर्ग.
आमचं नियोजन त्याच भागात म्हणजे खिरेश्वरच्या विरूद्ध दिशेला असलेल्या कोथळे उतरून वळसा घेत टोलार खिंड मार्गे खिरेश्वर परत. थोडक्यात असा लुप ठरविला होता. या ठिकाणी आणखी एक जाणवलं ते म्हणजे ही कारकाई निरोळी मानखंदा ते रांजणा पर्यंत ची रांग कोल्हेवाडी खिरेश्वर बाजूला सरळसोट तुटलेली आहे. त्यामुळेच या बाजूने भव्य एकसलग बसाल्टची महाकाय पर्वतरांग दिसते तर पल्याड मांडवी, फोफसंडी खोऱ्यात व कोथळे बाजूस सौम्य टप्प्यांत उतरण आहे.
तसेही दुपारचं जेवणाला या पेक्षा चांगली जागा नसावी. घरून आणलेले डबे काढत ईन मीन तीन भिडू बसले. जेवण झाल्यावर ओढ्याच्या कडेला सावली पाहून ताणून द्यावीशी वाटत होती. या निर्जन एकाकी डोंगरावर अशा ठिकाणी मुक्काम करायला नक्कीच मजा येईल. नीरव शांततेत अगदी निवांत, रमणीय सुर्यास्त, गुढ संधीप्रकाश, तारकासमूह पाहात लागणारी झोप, सकारात्मक ऊर्जेने भारावलेला सुर्योदय. सारंच हवंहवस.असो.....
हरिश्चंद्रगड फोफसंडी परिसरातील अनेक डोंगरावर अशा गुहा आहेत. काही अंतर जाताच सेम अजून एक गुहा डावीकडे लागली. त्यातही माणसांचा वावर असल्याच्या खुणा पण सध्या मात्र कुणीही नाही.
तसेच खाली उतरत राहिलो, वाट अधून मधून ओढ्यातून जाऊ लागली काही ठिकाणी तीव्र उतरण. दूरवर कोथळे परिसरातील घरे व शेतजमिनी दिसू लागल्या. चला तर परफेक्ट वाटेला लागलो. आता सारं नियोजनबद्ध जुळून येणार तेच पुढे असलेली साधना बसलेली दिसली. तिचा चेहरा वेगळाच वाटू लागला, जवळ गेल्यावर काय ते समजून गेलो. वाट The End होऊन खाली सरळ तीनशे साडेतीनशे फुटांचा फाॅल.
थोडक्यात सर्व ठिक आहे असं वाटत असतानाच मार्ग खुंटला. आम्हा तिघांची अवस्था एकसारखीच.. पुन्हा गेल्या मार्गी वर धापा टाकत आलो तसाही दुसरा पर्याय नव्हताच. देवाने दिलेल्या फोटो प्रमाणे काही अंतर आणखी पुढे जात डावीकडे एक धार कोथळे बाजूस उतरलेली वरून तरी दिसत होती. त्यात साधना म्हणाली तिथे न जाता सरळ आणखी वरच्या भागात जाऊन मग कोल्हेवाडीत उतरता येईल बहुदा ती उंबारल्याची वाट पण वेळचं गणित पाहता उंबारल्याचा ऑप्शन तर फारच कठीण तर कोथळे बाजूस जर उतरायचे झाले तरी मसाई दरा उतराई मग भैरोबा दुर्ग ला वळसा घालून त्या बाजूने टोलार खिंड चढाई मग खिरेश्वरला उतराई हा पण मोठा फेरा. घड्याळात पाहिलं तर चार वाजून गेलेले सारासार विचार करत मी आलो त्याच खराड मार्गे उतरायचे जाहीर केले. हाच एकमेव ऑप्शन अंधार पडायच्या आत खिरेश्वर पोहचणे जो एकदम सुरक्षित. हे ठरल्यावर अश्विनी काहीशी नाराज झाली दुसरी वाट उतराई राहून ट्रेक ठरल्याप्रमाणे होणार नव्हता तर तिला पुन्हा ती खराड दरा ची ती तीव्र घसराईवाली वाट आणि मुख्य म्हणजे सकाळी जसे वाट शोधत घुसून चढलो तो प्रकार नको होता. तिला म्हणालो, हा खराडचा अगदी सुरूवातीचा घसराई पॅच सावकाश पार करू मग पदरात गेल्यावर थेट खिरेश्वर कडे उतरायचे प्रयोग न करता सरळ आडवी मारत मळलेल्या कोल्हेवाडीच्या वाटेने जाऊ. तसेही साधना ने कोल्हेवाडी सुळका क्लांईब केला होता त्यामुळे पुढची वाट तीला माहीत होती. ठरलं तर, मघाच्या ओढ्यातून अर्धवट पाण्याचा बाटल्या पूर्ण भरून उतराईला सुरूवात केली.
पंधरा ते वीस मिनिटात खराड दरा ला आलो. खोलवर डावीकडे धरणाचे पाणी मावळतीकडे जाणाऱ्या सुर्य किरणानी चकाकत होते. सावधगिरीने पावलं टाकत योग्य ठिकाणी काठीचा आधार घेत तो घसारा टप्पा व्यवस्थित पार झाला. एक दोन थांबे घेत नाळेतून बाहेर येत गवताळ आडवी पकडली मग पदरातून झटपट पुढे जाऊ लागलो. मळलेलेल्या वाटेने आणखी एक टप्पा खाली उतरत मोकळवनात आलो. इथे काही ढोरवाटा चकवू पहात होत्या आम्ही मात्र दिशेप्रमाणे एकदम परफेक्ट सरकत होतो. मध्येच जंगलाचे टप्पे मग परत मोकळं पुन्हा जंगलात. असं आडव बरंच चालत होतो. साधनाला विचारत, कधी येईल तुझा सुळका ? ती पण न वैतागत येणार येणार म्हणत चालत होती. अखेर एकदाचा पदराला खालच्या बाजूने बिलगून असलेला कोल्हेवाडीचा सुळका दिसला. खाली कोल्हेवाडी सुध्दा व्यवस्थित नजरेत. आकाशातील रंगारंगांच्या छटा पाहत क्षणभर विश्रांती आणि आम्हा तिघांचा एक सेल्फी घेऊन चालू पडलो.
आत वाट सुळक्याला वळसा घालून नाळेतून खाली उतरू लागली. अर्ध्या पाऊण तासात ती दगड धोंड्यातली नाळ पार करून शेवटचा टेपाड उतरून सपाटीवर आलो. मग शेतं पार करत कोल्हेवाडीत दाखल झालो तेव्हा सुर्यास्त झाला होता.
वाडीतील नौशाद नावाचा मुलगा साधनाच्या ओळखीचा होता. त्याचाच घराच्या अंगणात विसावलो, गार पाणी मग त्याच्या अम्मीने कोरा चहा पाजला. खरंच तरतरी आली. नौशाद ने आम्हाला खिरेश्वर ला सोडले तेवढीच दीड दोन किमीची डांबरी रस्त्याची तंगडतोड वाचली.....
अलंग मदन कुलंग, रतनगड, नवरा नवरी,नाफ्ता,सांधण दरी, घनचक्कर ,मध्येच दूरवर धुक्यातून कळसुबाई शिखर आपलं अस्तित्व दाखवत होतं. दोन डोळ्यात हे सारं भरून घेत तिसऱ्या डोळ्याने क्लिकक्लिकाट चालू झाला.मन भरलं. उतरण्यास प्रारंभ केला. झपाट्याने खाली उतरत होतो. बऱ्याचं ठिकाणी घसरण असल्याने काळजीपूर्वक उतराव लागतं नाहीतर दाणकन पार्श्वभाग आपटण्याची शक्यता. आधारास कारवी होतीच. थोड्याच वेळात खाली पोहोचलो. गरमागरम पोहे व फोडणीचा भात हाणत कुमशेत कडे निघालो. पुढचं लक्ष्य होतं कात्राबाई डोंगर. चढाईस सुरूवात केली तेव्हा नारायणराव माथ्यावर आले होते. पण उकाडा जाणवत नव्हता . समोरच अजस्त्र असा कात्राचा डोंगर आमची प्रतीक्षा करत होता . ही डोंगरवाट आपलसं करीत होती. या डोंगरवाटांवर मनसोक्त बागडण्यासाठी तर भटके एवढया दुरवर येतात. काही ठिकाणी वाट चिंचोळी होती. कात्राची घनदाट जंगलवाट मन सुखावून टाकत होती. मजल दरमजल करत कात्राची वाट कापत होतो. कात्राच्या वाटेत मैलाचे दगड आहेत. असं म्हणतात कि गोरा साहेब भंडारदऱ्याहून रतनगडवर कात्राच्या खिंडीतून घोड्यावरून जायचा. वाटेत कात्राबाईचं मंदिर लागतं. तिथे नतमस्तक होत टॉपवर चढाईस सुरूवात केली. बाजूला गगनाला स्पर्श करणारे बेलाग डोंगर. पुढची वाट निमुळती आहे. तोल सांभाळावा लागतो. खाली नजर टाकली कि भंडारदऱ्याचा जलसंचय लक्ष वेधतो. एका बऱ्यापैकी मोठ्या चढाईनंतर कात्राचा टॉप दिसू लागतो. मोठच्या मोठं पसरलेलं विस्तीर्ण पठार. रतनगडाची भेट घेण्यासाठी माथ्याच्या कडेवर आलो. सह्याद्रीतलं हे रत्न समोरचं उभं ठाकलं होतं. खालची दरी छातीत धडकी भरवत होती. रतनगडचा खुट्टा दिमाखात उभा होता. थोड्या ढगाळ वातावरणामुळे बाकीचे गड लपून बसले होते. कात्राचा एक आगळा अनुभव घेत खाली उतरलो. वाटेत पिठलं भात खाऊन तृप्त होत गावची वाट धरली. एक आगळी मोहीम सुखरूपपणे पार पडली. बस तयार होतीचं. वाटाड्यांना निरोप दिला. बस भरधाव परतीच्या प्रवासास निघाली. सवंगड्यांना पुढच्या भटकंतीसाठी भेटण्याचं आश्वासन देत निरोप घेतला व मुंबईत परतण्यास आळेफाट्याला उतरलो ते ट्रेकच्या सुखद आठवणी सोबत घेऊनच.
पहाटेचे ६ वाजले आणि गजर झाला, २-३ तासांची झोप घेतली आणि सर्वजण आवरा आवरी करायला लागले. कुंजरगडाच्या मागील बाजुने हळु हळु सुर्य उगवत होता. मी सोबत आणलेला गॅस बाहेर काढला आणि readymade उपमा बनवायला सुरुवात केली. पुढच्या ५ मिनिटांमध्ये उपमा तयार झाला सर्व जणांनी हात पाय धुवून नाश्ता करून घेतला. सर्वांचं यावरून होईपर्येंत ७.३० वाजले, गावात असलेल्या भांगरे काकांचा आम्ही निरोप घेतला आणि कुंजरगडाच्या दिशेने कुच केली. इतिहासात या किल्ल्याला एक विशेष महत्व आहे. कांचनबारीच्या लढाईनंतर शिवाजी राजे १६७० साली येथे काही दिवस विश्रांती साठी होते. अहमदनगरच्या राकट प्रदेशात असलेल्या बेलाग किल्ल्यांपैकी हा एक, जास्ती करून सर्व ट्रेकर्स अलंग-मदन-कुलंग, रतनगड हरिश्चंद्रगड यांना भेट देतात पण त्यात बाजुला राहिलेले किल्ले कलाडगड, कुंजरगड. विहीर गावांमधुन कुंजरगड आडवा पसरलेला दिसतो, या किल्ल्याची एक सोंड विहीर गावाच्या बाजुला उतरते. या किल्ल्याला लागुनच बाळाईचा डोंगर आहे. कुंजरगडाचे दुसरे नाव कोंबड किल्ला. या किल्ल्याची उंची साधारण समुद्रसपाटीपासून ४०००-४५०० फूट आहे. किल्ल्यावर जायला २ वाटा आहेत एक वाट विहीर गावातुन जाते तर दुसरी वाट फोफसंडी गावातुन जाते. विहीर गावातुन दोन वाटा गडावर जातात, एक वाट सरळ खिंडीतून वर चढते, याच मार्गे पलीकडे फोफसंडी गावात जात येते. विहीर गावातील मंडळी लग्नकार्यासाठी, अथवा इतर कार्यक्रमांसाठी फोफसंडी गावात जाण्यासाठी या खिंडीमार्गे जाणाऱ्या वाटेचा वापर करतात. दुसरी वाट गडाला वळसा मारून बाळाई आणि गडाच्या मध्ये असलेल्या खिंडीतून वर गडावर चढते.वाटेत कुठे-कुठे पिवळ्या फ़ुलांचे गालीचे होते तर कुठे हिरवीगार भाताची शेत डोलत होती. क्लीकत क्लीकत चाललो होतो.




हिरवी शेते

नेहमीप्रमाणे माननीय श्री. आनंद पाळंदे यांचे "डोंगरयात्रा" पुस्तक बरोबर होतेच. त्यात म्ह्टल्याप्रमाणे विहीर गावातुन कुंजरगडावर दिड तासात पोहोचता येते. पण प्रत्यक्षात आम्हाला पावणे तीन तास लागले. मी म्ह्टलं त्यांनी कुंजरगडावरुन विहीर गावात ऊतरायला दिड तास म्ह्ट्लं असेल आपल्याला चढुन जायचं असल्याने थोडा जास्त वेळ लागला. पण तरीही एवढा फ़रक पडत नाही कधी आनंद पाळंदे यांनी दिलेल्या वेळेमध्ये आणि आपल्या वेळेमध्ये. काहीही असो पण पुन्हा एकदा वेळेचा अंदाज चुकला होता एवढ मात्र खरं.
दुस-या टेकाडावर

दुस-या टेकाडावरुन विहीर गाव

वाटेतील हनुमान मंदिर
दाट झाडीतुन जाणारी वाट

साधारण ३.०० च्या सुमारास कुंजरगडाच्या माथ्यावर पोहोचलो. माथ्यावर विशेष काहीही नाही. पुस्तकात म्हट्लं आहे "माथ्याच्या डावीकडे गेल्यावर एकमेव टाके आहे" पण प्रत्यक्षात आम्हाला तीन टाकी दिसली ("डोंगरयात्रा"चा आणखी एक धक्का) असो.
कणीस ?

कणसाचे दाणे (झुम)

गवत

"गडाच्या उत्तर टोकाजवळ एक खोदीव बोगदा आहे, यातुन रांगत आत गेल्यावर कड्यावर उघडणारे दुसरे तोंड आढळते" (इती "डोंगरयात्रा"). जाऊन पाहिले खरच एक खोदीव बोगदा आहे पण रांगत जाणे कठीण वाट्ले शिवाय आतमध्ये पाणी साठ्ले होते आणि पुढे वाकुन पाहिले तर बुजवल्यासारखे वाटले त्यामुळे रांगत जाऊन कड्यावर उघडणारे दुसरे तोंड बघायचा मोह आम्ही आवरला.
बोगदा
मी आणि गिरीष



तिथेच एका टाक्यापाशी खाऊन घेतलं टाक्यातल गार पाणी पिऊन त्रुप्त झालो आणि निघालो. ऊतरत असताना वाटेत पुन्हा त्या मामाचा फ़ोन आला बराच वेळ झाला कुठे आहात? म्हटलं येतोच अर्ध्या तासात. साधारण साडेपाच वाजता पुन्हा विहीर गावात आलो. येतानाच आज आपला कलाडगड काही होणार नाही तेव्हा ऊद्या तीन गड करण्यापेक्षा कलाडगड ड्रॊप करुन आज भैरवगडावर जाऊन राहु असं ठरलं.
कारकाई
चिंतामणच्या दारात बुलेट लावली. चहा नाश्ता घेत
खिरेश्वर सोडेपर्यंत साडेनऊ झाले. यंदा निमित होेते हरिश्चंद्रगड बालाघाट
रांगेतील हरिश्चंद्रगडचा शेजारी कारकाई... सोबतीला, अश्विनी आणि साधना.
गावाची आश्रमशाळा सोडून शेतीवरील बांधावरून चालू पडलो. वाटेत
काही मुलं खेळताना दिसली त्यांना विचारत वाटेची खात्री करून घेतली. टोलार
खिंडीला डावीकडे ठेवत समोरच्या महाकाय डोंगराची दिशा धरली. सुरूवातीस वाट
झक्क मळलेली नंतर एका टेकडीला वळसा घालून आतल्या बाजूने वर चढू लागली. आधी
वाटलं हि टेकडी चढून पदरात जाऊ मग विरूद्ध बाजूला असलेल्या मुख्य धारेवर
येऊ. काही मिनिटातच दोघं तिघं गवताचे भारे वाहून आणताना भेटले. त्यांनी तर
कारकाई ला इकडून वाट नाही अस स्पष्ट सांगून टाकले. हि लोकं आतल्या बाजूस
लाकूडफाटा गोळा करायला जातात, तसेच टेकडीच्या माथ्यावर जनावरं घेऊन.
माघारी वळून मुख्य ओढा पार करून पलीकडील बाजूस गेलो. एक अस्पष्टशी वाट धरली
आत खोलवर जंगलात शिरत ती वाट काही चढाईला लागेना. दिशेप्रमाणे उजवीकडे
कारवीच्या रानात घुसखोरी केली. ते पार करत मग ठिसूळ बारीक दगडगोटे तीव्र
चढाई त्यात स्क्री. काही मिनिटातच त्या गचपणातून बाहेर येत आडव्या अरुंद
अशा ट्रेव्हर्स वर आलो. आता समोरच्या बाजूस उजवीकडे होती ती कारकाई ची वाट
त्याच वाटेला काहीजण खराड असेही म्हणतात. पंचेचाळीस अंशाहून अधिक तीव्र
कोनात असलेली अरूंद वाट पार करून पदरात दाखल झालो. थोडं उजव डावं करत मुख्य
वाटेवर आलो. काही अंतर जाताच दोघेजण दिसले
विचारपूस केल्यावर कळले की कारकाई ला खिरेश्वरहून सहसा कुणी जात
नाहीत, हि मुख्य वाट कोल्हेवाडीतून येते. साधारण अर्धा पाऊण तास दाट
जंगलातून चाल, तांबट चा कुटर कुक तर अधून मधून कानी पडणारा शिळकरी कस्तुर.
पदरातील वाट थेट कड्याला चिकटून बाहेर आली. खाली पाहिलं तर आम्ही बरीच ऊंची
गाठली होती. पिंपळगाव जोगा धरणाचा निळाशार फुगवटा, खिरेश्वर आसपासच्या
वाड्या वस्त्या तर समोर डोंगराचे कातळकडे नजर थेट टोलारच्या दिशेने जात
हरिश्चंद्रगडाच्या बालेकिल्ल्यातच. उजवीकडे कडा तर डावीकडे दरी अशी अरूंद
वाट तिरक्या रेषेत चढाई. अधे मध्ये पिवळीधम्मक गवताची पाती. वीसेक मिनिटातच
मुख्य नाळेत आलो याच वाटेला खराड दरा असे म्हणतात. सुरूवातीस बऱ्यापैकी
रूंद असलेल्या नाळेत फार अशी झाडं नाहीच. तुरळक कारवी, कुठे खुरटी झुडपं तर
मध्येच एखाद दुसरं ऊंबराचे झाडं, भर उन्हात तेच काय सावलीचे ठिकाण.
नेहमीप्रमाणेच जसजसे वर जाऊ लागलो नाव अरूंद होत आजूबाजूचे कडे चांगलेच
भेदक वाटू लागले. शेवटच्या टप्प्यातील दगडांचा खच आणि भयंकर घसारा दोन तीन
पावलं वर गेलं तर एखादा पाऊल खाली येणारच. डावं उजवं करत कड्याचा आधार घेत
अस्तेकदम वर पोहचलो. फार सपाट नसलेल्या ऊंच सखल माथ्यावर गवताळ पठारावरून
आजूबाजूचा बराच प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. पूर्वेस वारल्याची टेकडी,
निरोळी कडील बाजू. पश्चिमेला पिंपळगाव जोगा जलाशया मागे उधळ्या, सिंदोळा,
भोजगिरी कडील बाजू तर उत्तरेला हरिश्चंद्रगडाचा पसारा. अर्थात वातावरण धुसर
असल्याने फार अजून काही पाहता आलं नाही. मळलेली एक वाट घेतली त्यानुसार
साधारण हरिश्चंद्र दिशेने निघालो.साधना तर आधी म्हणत होती असेच जाऊ व टोलार
खिंडीत उतरू. हे म्हणायला जरी सोपं असलं तरी हा कारकाईचा डोंगर जो
हरिश्चंद्रगडाचा शेजारी जरी असला तरी तो टोलारच्या दिशेला टप्पा टप्प्यात
टेकडीने जोडला आहे. सहाजिकच खिंड व काहीशी अवघड चढाई उतराई. वाट एका ठिकाणी
कोरड्या ओढ्यात उतरत नाहिशी झाली. आम्ही तसेच पुढे उजवीकडे दरीच्या काठावर
जाऊन पाहिलं तर खाली डाव्या बाजूला बर्यापैकी दूरवर भैरोबा दुर्ग. आमचं
नियोजन त्याच भागात म्हणजे खिरेश्वरच्या विरूद्ध दिशेला असलेल्या कोथळे
उतरून वळसा घेत टोलार खिंड मार्गे खिरेश्वर परत. थोडक्यात असा लुप ठरविला
होता. या ठिकाणी आणखी एक जाणवलं ते म्हणजे ही कारकाई निरोळी मानखंदा ते
रांजणा पर्यंत ची रांग कोल्हेवाडी खिरेश्वर बाजूला सरळसोट तुटलेली आहे.
त्यामुळेच या बाजूने भव्य एकसलग बसाल्टची महाकाय पर्वतरांग दिसते तर पल्याड
मांडवी, फोफसंडी खोऱ्यात व कोथळे बाजूस सौम्य टप्प्यांत उतरण आहे.
दरीच्या काठाने चालू लागलो, एखादी वाट त्या बाजूला उतरते का ते
पाहत. तसंच जात वरच्या भागात आलो एका लहानश्या ओढ्याला चांगल स्वच्छ वाहतं
पाणी, ऐन जानेवारीत असं पाणी मिळणं हे भारीच. तसेही दुपारचं जेवणाला या
पेक्षा चांगली जागा नसावी. घरून आणलेले डबे काढत ईन मीन तीन भिडू बसले.
जेवण झाल्यावर ओढ्याच्या कडेला सावली पाहून ताणून द्यावीशी वाटत होती. या
निर्जन एकाकी डोंगरावर अशा ठिकाणी मुक्काम करायला नक्कीच मजा येईल. नीरव
शांततेत अगदी निवांत, रमणीय सुर्यास्त, गुढ संधीप्रकाश, तारकासमूह पाहात
लागणारी झोप, सकारात्मक ऊर्जेने भारावलेला सुर्योदय. सारंच हवंहवस.असो.....
देवा घाणेकर ने हा ट्रेक आधी केला होता. त्याला कोथळे कडील वाट
कन्फर्म करायला फोन लावला. त्याने कोथळे च्या वाटेने चढाई केली होती त्या
वाटेला मसाईदरा असं म्हणतात. देवाने फोन वर सविस्तर माहिती देत काही फोटोज
पाठवले. त्यावरून दिशेप्रमाणे अंदाज बांधून ओढ्याच्या पलीकडील बाजूच्या
घळीने उतरायला सुरूवात केली. आधी करवंदाची जाळी मग कारवी पण दगडातून अगदी
रचाई केलेली वाटावी अशी मळलेली वाट. म्हटलं चला भारीच काम झालं. तीन चारशे
फूट उतरल्यावर उजवीकडे प्रशस्त गुहा लागली. कारवीचे बारीक दांडे त्यावर शेण
माती लिंपून आडोसा तयार केलेला आत मध्ये डोकावत पाहिलं तर रिकाम्या
पाण्याच्या बाटल्या, तेलाचा कॅन व चटई. सरत्या पावसात कोथळे परिसरातील
गावकरी इथे नक्कीच गुरं ठेवत असावीत. हरिश्चंद्रगड फोफसंडी परिसरातील अनेक
डोंगरावर अशा गुहा आहेत. काही अंतर जाताच सेम अजून एक गुहा डावीकडे लागली.
त्यातही माणसांचा वावर असल्याच्या खुणा पण सध्या मात्र कुणीही नाही. तसेच
खाली उतरत राहिलो, वाट अधून मधून ओढ्यातून जाऊ लागली काही ठिकाणी तीव्र
उतरण. दूरवर कोथळे परिसरातील घरे व शेतजमिनी दिसू लागल्या. चला तर परफेक्ट
वाटेला लागलो. आता सारं नियोजनबद्ध जुळून येणार तेच पुढे असलेली साधना
बसलेली दिसली. तिचा चेहरा वेगळाच वाटू लागला, जवळ गेल्यावर काय ते समजून
गेलो. वाट The End होऊन खाली सरळ तीनशे साडेतीनशे फुटांचा फाॅल. थोडक्यात
सर्व ठिक आहे असं वाटत असतानाच मार्ग खुंटला. आम्हा तिघांची अवस्था
एकसारखीच.. पुन्हा गेल्या मार्गी वर धापा टाकत आलो तसाही दुसरा पर्याय
नव्हताच. देवाने दिलेल्या फोटो प्रमाणे काही अंतर आणखी पुढे जात डावीकडे एक
धार कोथळे बाजूस उतरलेली वरून तरी दिसत होती. त्यात साधना म्हणाली तिथे न
जाता सरळ आणखी वरच्या भागात जाऊन मग कोल्हेवाडीत उतरता येईल बहुदा ती
उंबारल्याची वाट पण वेळचं गणित पाहता उंबारल्याचा ऑप्शन तर फारच कठीण तर
कोथळे बाजूस जर उतरायचे झाले तरी मसाई दरा उतराई मग भैरोबा दुर्ग ला वळसा
घालून त्या बाजूने टोलार खिंड चढाई मग खिरेश्वरला उतराई हा पण मोठा फेरा.
घड्याळात पाहिलं तर चार वाजून गेलेले सारासार विचार करत मी आलो त्याच खराड
मार्गे उतरायचे जाहीर केले. हाच एकमेव ऑप्शन अंधार पडायच्या आत खिरेश्वर
पोहचणे जो एकदम सुरक्षित. हे ठरल्यावर अश्विनी काहीशी नाराज झाली दुसरी वाट
उतराई राहून ट्रेक ठरल्याप्रमाणे होणार नव्हता तर तिला पुन्हा ती खराड दरा
ची ती तीव्र घसराईवाली वाट आणि मुख्य म्हणजे सकाळी जसे वाट शोधत घुसून
चढलो तो प्रकार नको होता. तिला म्हणालो, हा खराडचा अगदी सुरूवातीचा घसराई
पॅच सावकाश पार करू मग पदरात गेल्यावर थेट खिरेश्वर कडे उतरायचे प्रयोग न
करता सरळ आडवी मारत मळलेल्या कोल्हेवाडीच्या वाटेने जाऊ. तसेही साधना ने
कोल्हेवाडी सुळका क्लांईब केला होता त्यामुळे पुढची वाट तीला माहीत होती.
ठरलं तर, मघाच्या ओढ्यातून अर्धवट पाण्याचा बाटल्या पूर्ण भरून उतराईला
सुरूवात केली. पंधरा ते वीस मिनिटात खराड दरा ला आलो. खोलवर डावीकडे धरणाचे
पाणी मावळतीकडे जाणाऱ्या सुर्य किरणानी चकाकत होते. सावधगिरीने पावलं टाकत
योग्य ठिकाणी काठीचा आधार घेत तो घसारा टप्पा व्यवस्थित पार झाला. एक दोन
थांबे घेत नाळेतून बाहेर येत गवताळ आडवी पकडली मग पदरातून झटपट पुढे जाऊ
लागलो. मळलेलेल्या वाटेने आणखी एक टप्पा खाली उतरत मोकळवनात आलो. इथे काही
ढोरवाटा चकवू पहात होत्या आम्ही मात्र दिशेप्रमाणे एकदम परफेक्ट सरकत होतो.
मध्येच जंगलाचे टप्पे मग परत मोकळं पुन्हा जंगलात. असं आडव बरंच चालत
होतो. साधनाला विचारत, कधी येईल तुझा सुळका ? ती पण न वैतागत येणार येणार
म्हणत चालत होती. अखेर एकदाचा पदराला खालच्या बाजूने बिलगून असलेला
कोल्हेवाडीचा सुळका दिसला. खाली कोल्हेवाडी सुध्दा व्यवस्थित नजरेत.
आकाशातील रंगारंगांच्या छटा पाहत क्षणभर विश्रांती आणि आम्हा तिघांचा एक
सेल्फी घेऊन चालू पडलो. आत वाट सुळक्याला वळसा घालून नाळेतून खाली उतरू
लागली. अर्ध्या पाऊण तासात ती दगड धोंड्यातली नाळ पार करून शेवटचा टेपाड
उतरून सपाटीवर आलो. मग शेतं पार करत कोल्हेवाडीत दाखल झालो तेव्हा
सुर्यास्त झाला होता. वाडीतील नौशाद नावाचा मुलगा साधनाच्या ओळखीचा होता.
त्याचाच घराच्या अंगणात विसावलो, गार पाणी मग त्याच्या अम्मीने कोरा चहा
पाजला. खरंच तरतरी आली. नौशाद ने आम्हाला खिरेश्वर ला सोडले तेवढीच दीड दोन
किमीची डांबरी रस्त्याची तंगडतोड वाचली.....
दुसरी वाट झाली नाही, पण वेळेत कारकाई पाहून खाली आलो हेही काय कमी नाही.
वाटाड्या अथवा गाईड घ्यावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.. मी तरी हे
सारासार विचार करून ठरवतो. तरीही मला विना गाईड, अनुभव आणि कौशल्य वापरून
केलेली भटकंती खुप आवडते. सर्व व्यवस्थित घडलं तर बल्ले बल्ले नाहीतर आहेच
जमा होणारा अनुभव...
किल्ले कुंजरगड सफर (Trek to Kunjargad)
आपल्या आयुष्यात काही गोष्टी आपण कमवतो तर काही आपल्याला फक्त नशिबाने मिळतातं आणि त्यात आपलं काहीच कर्तृत्व नसतं. आशा गोष्टींचा दुर्दम्य अभिमान बाळगावा असं मला स्वतःला तरी वाटत नाही. आपला जन्म हा यांपैकीच एक; पण तरीही तो महाराष्ट्रात झाला आणि तोही मराठी म्हणून, हे एकचं मी माझे अहोभाग्य समजतो.
स्वराज्य कसे मिळवावे, त्याचं सुराज्य कसे करावे याचा प्रत्यय देणारा एकमेव राजा छत्रपती इथे, या मातीतचं झाला आणि आपण त्यांचेच अनुयायी आहोत.
इथला सह्याद्री आणि त्यावरचे गडकिल्ले हे फक्त दगड-मातीच्या इमारतींचे अवशेष नसून, ते राज्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याने, त्यागाने पवित्र झालेले यज्ञकुंडच आहेत. म्हणूनच हे गड किल्ले म्हणजे पर्यटनक्षेत्र नसून रणक्षेत्र आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन या किल्ल्याचे जतन आणि संगोपन आपण केले पाहिजे.
कुंजरगड! लोहगडासारखा विंचूकाटा आहे या गडाला; पण या काट्यावर लोखंडी रेलिंगची तोरण लावून त्याची पार लया घालवलीय आता! तटबंदी बर्यापैकी शिल्लक आहे, यावर, दोन-तीन दगड लावून डागडुजी करून गडाचं गडपण राखून ठेवता आलं असतं पण...असो..१६७० मध्ये राजे दिंडोरीची लढाई लढून इथे आले होते. गडावर मावळ्यांची मलमपट्टी आणि विश्रांती झाली होती.
कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट ओलांडल्यावर एक डोंगरावर सतत अंगावर येत असते, बालाघाट डोंगररांग. हरिशचंद्रगडापासून सुरु होणारी ही रांग बीड जिल्हापर्यंत जाऊन संपते. पुणे आणि अहमदनगर जिल्हाची सीमा माळशेज घाटात हीच डोंगररांग ठरवते. हा किल्लाही तसाच जवळपास दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर आहे पण नकाशावर तो अहमदनगरच्या अकोले तालुक्यात येतो. हरिशचंद्राच्या मागच्या बाजूस असणाऱ्या या डोंगररांगेत कलाडगड, दोन भैरव (कोलथे आणि शिरपुंजे), कुंजरगड इत्यादी किल्ले येतात. बाकी सर्व किल्ले पाहून झाले होते, कुंजर सोडून म्हणून मग ही रेंज पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवाळी संपण्याची वाट पाहत होतो.'
कुंज' म्हणजे हत्ती, पायथ्याच्या विहीर गावातून हत्तीसारखा दिसतो म्हणून 'कुंजरगड' हे नाव. कोंबडकिल्ला हे या गडाचं इकडंच स्थानिक नाव.
'कुंजर' आडवाटेवर असणारा दुलक्षित किल्ला म्हणून मग, सायटिका या माझ्या पाठीशी लागलेल्या आजाराला थोडी बगल देऊन पुन्हा आमच्या दोनचाकी घोड्यावर टांग मारली. जुन्या शेड्युलप्रमाणे भल्या पहाटे सकाळी ४ ला निघून मुरबाड-माळशेज घाट मार्गे खुबी फाट्याच्या थोड्या अलीकडे पहिला ब्रेक घेतला तेव्हा ६ वाजले होते. डोंबिवलीपासून आतापर्यंत अपेक्षित थंडी काही जाणवत नव्हती तरी प्रथेप्रमाणे कटिंग मारून पुन्हा दोन तासाचा प्रवास सूरु केला. त्या उफळत्या चहा बरोबर समोरच्या डोंगररांगेतून उगवत्या सूर्याचं देखणं रूप...अहाहा...दिन बन गया!! पुन्हा बाईकवर बसलो आणि आणि थोडा गारवा जाणवायला लागला, हाच अनुभवण्यासाठी आमच्यासारखे अनेक फिरस्ते निघतात या सिजनमध्ये. पुढे ओतूर गाठायचा अगोदर 'उदापुर' जवळून एक फाटा 'फोपसंडी' साठी जातो. कुंजरगडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक विहीर गावातून तर दुसरी फोपसंडी मधून, आम्ही दुसरी वाट निवडली. उदापुर मार्गे अनेक लहान डोंगरी गावांतून वाट फोपसंडिला जाते. रस्ता अतिशय खराब, कोपरे गावातून पुढे तर कच्चा आणि खडतर रस्ता आहे. त्या निमित्ताने आमची ऑफरोड बायकिंगची हौस पण पूर्ण झाली ट्रेकिंग बरोबर. या वाटेवर अनेक धबधबे आहेत आणि तेच बघण्याचा मोहापायी मी सचिनला या वाटेने जाण्याचा आग्रह केला होता पण थोडं लेट झालो आम्ही आणि फक्त डोंगर-दऱ्या पहिल्या मिळाल्या.
फोपसंडी गावातून ट्रेक सोपा आणि लहान आहे साधारण १ ते १.३० तासांचा. गावात बाईक पार्क करून आम्ही गडाची वाट धरली. गावातून गाद दिसत नाही तो एका टेकडाच्या मागे आहे. भाताच्या, वालाच्या मळ्यांतून आणि उतारावर लावलेल्या नाचणीतून वाट काढत आम्ही पुढे जात होतो. आणि समोरच्या डोंगरावर किल्ल्याच्या बुरुजाची तटबंदी स्पष्टपणे दिसायला लागली. वाटेत एका झापात एक कुटुंब विसावल होतं, घराची म्हातारी ऊन खात बसली होती. लहान चिऊ आणि एक दादा मचाणाला बांधलेल्या झोक्याला झुलत होते, घरचा मोठा दादा समोरच्या डोंगरावर गुरं घेऊन गेला होता. आमचा आवाज ऐकुन घराचा कर्ता पण बाहेर आला. गडाची तटबंदी समोर दिसत होती पण आमच्या माहितीप्रमाणे वाट फिरुन जात होती. वेळ वाचवा म्हणून तटबंदीला लागून असणारा कातळटप्पा चढून जाता येईल का याची चौकशी केली. थोडं आढवेढ घेऊन आणि आमच्याकडे निरखून पाहून म्हणाला, हाय, पण जरा अवघड हाय, जमेल वाटत तूम्हाला. मग काय, ती तटबंदी नजरेसमोर ठेवून आम्ही चालू लागलो. तटावर पोहोचल्यावर इशारा द्या, असे बजावले या बाजीप्रभूने आम्हला आणि त्या झापाच्या दारातून वर पोहोचेपर्यंत तो आम्हाला पाहत आणि आवाज देत होता. इथून एक टेकडी पार करून आम्ही एका पठारावर आलो इथे संपुर्ण भारतभर दिसणारे असे कॉमन दृश्य दिसले, एका झाडाखाली एक थडगे होते आणि त्यावर भगवा झेंडा लावलेला होता. या पठारावरून उजवीकडून वाट फिरून गडाच्या प्रवेशद्वारापाशी जाते पण आम्ही काही सरळमार्गी नव्हतो. समोरची लहानशी चढण पार करुन तटाला लागून असलेल्या कातळाला लागलो. सचिनने सुरवात केली आणि सहज पार केला, मागून मी तो लहानसा कातळटप्पा पार केला. खालून दिसणाऱ्या त्या तटबंदीला पोहोचलो. ही गडाची डावी बाजू, याच तटबंदीला पाणि वाहून जाण्यासाठी एक नलिका बनवली आहे. वर तटबंदीवर पोहोचताच त्या बजीप्रभुची आरोळी आम्हाला आली तिला हुंकार देऊन आम्ही आमची गडफेरी सूरु केली.
तटबंदीवरुन वर जाऊन आम्ही डाव्या बाजूने फिरायला सुरवात केली. तटबंदीच्या जवळच दोन बर्यापैकी मोठी पाण्याची टाकी आहेत. यांची रचना एका मागे एक आहे जेणेकरून एक टाक भरलं की पाणि दुसऱ्या टाक्यात जाईल आणि ते भरलं की तटबंदीला केलेल्या निचऱ्यातून बाहेर. पुढे समारोच्या डोंगराच्या आणि गडाच्या दरीमूळे किल्ल्याची खरी उंची कळत होती. पुढे ३ टाक्यांचा एक समूह लागतो. यालाच लागून मागे वाड्याचे काही अवशेष आहेत. हे वाड्याचे अवशेष पाहून पुढे आल्यावर आपण गडाच्या माचीवर पोहचतो. लोहगडाच्या विंचूकाट्या सारखी गडावरून दूर जाणारी माची आहे या गडाला. वाड्याच्या प्रवेशद्वारातुन बाहेर आल्यावर आजच्या बाजूला शंकराची पिंड, नंदी नुकतेच वसवले आहेत. या मंदिराच्या उजव्या बाजूला लागूनच दोन पाण्याची टाकी आहेत आणि डाव्या बाजूला पुढे पाण्याचं अजून एक टाक आहे. टाक्याला व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. इथून पुढे माचीवर एका वाड्याचे अवशेष आहेत आणि त्यात एक मारुतीची मूर्ती आहेत. हा मारुती मस्त मिशी बाळगून आहे चेहऱ्यावर. पुढे या माचीच्या टोकापर्यंत जाऊन आलो. मध्ये आजून दोन पाण्याची टाकी आहेत माचीवर. एका टाक्याला तर भुयारी मार्गासारखे चौकोनी भुयार केले आहे, आत वाकून पाहिलं तर आत बऱ्यापैकी पाणि होतं, पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी दगडाच्या आत टाकं खोदल असावं बहुतेक. लोखंडी रेलिंगने हीचा कणखरपणा बोथट केल्यासारखा वाटला. या माचीवरून डाव्या बाजूला मागे हरिशचंद्राची रांग, तारामती सुळका, त्याच्या पुढे, कलाड, भैरव अगदी स्पस्ट दिसत होते. पायथ्याचे विहीर गाव एका लहानश्याया वस्तीसारखे दिसत होते. मागे वळून आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. प्रवेशद्वाराचे अवशेष असे काही उरले नाही आहेत पण काही दगडी पायऱ्या आहेत इथे. दोन्ही गावांतून, फोपसंडी आणि विहीर, येणाऱ्या वाटा इथे येऊन मिळतात. याच वाटेवर दोन मोठया नैसर्गिक गुहा आहेत. आजून थोडं पुढे जाऊन या किल्ल्याच वैशिष्ट्य असलेली गुहा आहे, डोंगराच्या आरपार खोदलेली ही गुहा एका बाजूला विहीर आणि दुसऱ्या बाजूला फोपसंडी गावाकडे लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आली असावी. सचिनने प्रयत्न केला पण माझ्या शरीरयष्टीमुळे मला तोही करता आला नाही. खुपच अरुंद आहे ही, जवळजवळ सरपटत जावं लागतं. गुहेत अजुनही पाणि साठलेलं होत आणि त्या अरुंद बोळात पुढे चिखलही होता म्हणुन मग सचिनही मागे फिरला. गडफेरी पूर्ण करून आम्ही पुन्हा फोपसंडी गावाच्या वाटेला लागलो. वाटेत पुन्हा ते काका भेटले, गुरं राखताना, न पाहता आलेल्या गुहेच्या बद्दल विचारपूस केली आणि तेच उत्तर मिळालं, अर्ध्यापर्यंत सरपटत किंवा ओणव्याने जावं लागतं. पुढे एका ठिकाणी अंग तिरप करून कुशीवर सरकाव लागतं आणि मग आपण विहीर गावाच्या बाजूला बाहेर निघतो. माझ्याकडे पुन्हा पाहून काका म्हणाले, 'ह्यांना नसतं जमलं !!'....सचिन तर आपला एव्हरग्रीन आणि सडपातळ बांधा म्हणून माझा आदर्श आहेचं पण साला अश्यावेळी थोडी जळतेच !! फोपसंडी गावातून साधारण एकला निघून ६च्या दरम्यान आम्ही घरी परतलो.
कुंजरगड, पाण्याच्या टाक्यांचा किल्ला. जवळपास १० टाकी आहेत या किल्ल्यावर. तटबंदी, बुरुजही अजून बऱ्यापैकी शाबूत आहेत. गडांची उंची आणि उंचीवरचे गड कसे असतात, कसे राखले जायचे हे पाहायचं असेल तर वाट वाकडी करून जरूर पहावा असा एक किल्ला !!
Comments
फोफसंडी
संतांचे माहेर जसे पंढरपूर तसे आम्हा शहरी भटक्या मंड़ळीचे हरिश्चंद्रगड. हल्ली वाढत्या गर्दीमुळे जरी जाणं होत नसले तरी मनात कुठेतरी ठाण मांडून बसलेला.
याच हरिश्चंद्रगड परिसरात कलाडगड, भैरवगड, भैरोबा दुर्ग, कुंजरगड उर्फ कोंबडा किल्ला असे या भागातील मातब्बर गडकोट.
यावेळी इथल्या कुंजरगड फोफसंडी मांडवीचे खोरं या परिसरात बाईक राईड करायचे ठरवले. सुरुवातीलाच एक दोघांचा नकार ऐकल्यानंतर मग काय, एकला चलो रे... विजयादशमीचा आदला दिवस शनिवार, तो निवडला. सकाळी पावणेसहाच्या सुमारास सर्व तयारीनिशी बुलेटला किक मारली. टारगेट, चलो फोफसंडी... दोन तासात माळशेज टॉप.
गार हवेत घाटात दोन चार फोटो मारुन, आरामात पुढच्या पाऊण तासात बनकर फाटा पुढील उदापूर गाठले. उदापूरहून डावी मारत, मुथाळणे कोपरे रोड पकडला. वाटेवर दिशादर्शक पाटी होतीच.
वाटेतले मांदारणे सोडल्यावर मुथाळणे पर्यंत सहा किमीचा अरुंद वाटेचा कठीण घाट. तो चढून वर आल्यावर उजवीकडे वाघोबा देव, तिथेच थोडा वेळ सकाळचा गार वारा खात बसलो.आता मात्र सुरु झाला तो डोंगर दरींचा प्रदेश. पुर्ण रस्ता घाटाचा, डोंगर उतारावर छोटी छोटी घरे काही ठिकाणी लहान लहान वाड्या वस्त्या. कोपरे या भागातले शेवटचे गाव. कहिश्या दुर्गम अशा ठिकाणी जुन्नर ओतुर या भागातून इथवर एस्टी येते.
कोपरे सोडल्यावर आधीच अरुंद असलेला डांबरी रस्ता गायब. इथून पुढे फोफसंडी साठी मोठा रस्ता नाही हे माहित होते पण निदान कच्चा तरी बरा असावा...कसले काय.. फोफसंडी अंदाजे सहा ते सात किमी असावे. गावाबाहेर पडताच एकाला रस्त्याबद्दल विचारलं. "थोडा खराब आहे पुढं देवनाळ्या पासून डांबरी आहे". हरकत नाही बघू काय तें म्हणून किक मारली. सुरुवातीला माती छोटी दगड मग काहीसा बरा खडी टाकलेला. पण काही ठिकाणी खडी एवढी की बाईक घसरुन पडावी. गाव मागे पडून टिपिकल घाट रस्ता सुरु. मध्ये जंगल पट्टा लागला, या भागात तर ना दगडी ना खडी नुसता लाल चिखल बाईकवर तोल सांभाळत कसरत. हा शांत निर्जण निसर्गरम्य घाट रस्ता मला सारखं डिगा ते खानू रस्त्याची आठवण करुन देत होता. पुर्ण रानात फक्त बुलेटचा काय तो डूग डूग आवाज. काही अंतर जात उतार मग ओढा, उतारावर बाईक कण्ट्रोल करत झपकन ओढ्यातून बाहेर काढली मग पुढचा चढ दगड गोट्याचा सावकाश पार केला. हे होत नाही तर पुढे बर्यापैकी वाहत्या पाण्याचा ओढा. मनाचा हिय्या करुन टाकली पण ऐन मध्यभागी आल्यावर तोल सावरायला पाय टेकवावे लागले. बुटात पाणी गेल्याचं दुःख नाही पण बाईक नको मध्ये बंद पडायला, रेस करुन कशीबशी बाहेर काढली. आता या दोन प्रसंगा नंतर मला रस्त्याची काळजी वाटू लागली. पुढे काय वाढून ठेवले असणार ? जर काही झालं तर मदतीला सोबत कुणी नाही, जवळपास वस्ती नाही. आता पर्यंत नितांत सुंदर वाटत असलेल्या रानात अचानक मळभ दाटून आल्यासारखे वाटले. पाणी पित जरा वेळ शांत बसून राहिलो. एक विचार असाही आला की परत मागे फिरुन ओतुर कोतुळ मार्गे जावे का पण नाही क्षणात तो विचार झटकून टाकला. तसेही परत जायला हे दोन पडाव आहेतच, त्या पेक्षा जाऊ, पुढे पाहू काय होईल ते. जे होतं ते चांगल्यासाठीच हा विचार करुन किक मारली. काही अंतर जाताच दरी पल्याड एक घर आणि जवळ चारचाकी उभी दिसली. ते पाहून जरा हायसं वाटलं. पण तिथवर पोहचण तेवढं सोपं नव्हतं. मधल्या डोंगराला वळसा घालून तिथे जायचं होते. वाटेत पुन्हा एक मोठा चिखलचा टप्पा, इथे मात्र उतरुन गाडी ढकलत न्यावी लागली. एक गोष्ट लक्षात आली, जंगल टप्प्यात ओढ्या जवळील रस्ते सदासावलीमुळे चिखलाचे तेच मोकळं वनातील उन्हामुळे कोरडे ठाक. गाववाला चांगला रस्ता लागेल असं म्हणाला होता पण सद्यस्थिती पाहून मला तर कुठे चांगली चिन्ह दिसेना. उतारा वरील खडकाळ टप्पा पार करुन एका मोठ्या ओढ्यावरील पुलावर आलो, इथून पुढे मात्र खडी मिश्रित रस्ता दिसला.
पुलापलिकडे दोघं जण मस्त पैकी म्हशीला अंघोळ घालत होते. वाहत्या पाण्यात मी पण चिखलात माखलेले बूट धुवून घेतले. हाच देवनाळ्याचा पूल इथून फोफसंडीची हद्द सुरु होते. चढ चढून सपाट रस्ता, काही अंतर जात मघाशी दिसलेले घर उजवीकडे.
अंगणात दोघे बसलेले विचारलं तर म्हणाले, "ही काय आली फोफसंडी ..पुढे डांबरी रस्ता आहे." घडल्या प्रकरणात कोपरे ते फोफसंडी माझा पाऊण तास गेला. गावच्या सुरुवातीची दोन चार घरं सोडल्या वर एका घरावर ‘सह्याद्री दर्शन पथिकालय’ असा बोर्ड लावलेला.
गाडीचा आवाज ऐकून गृहस्थ बाहेर आले. ‘दत्तात्रय मुठे’ त्यांचे नाव, आपुलकीने स्वागत केले. विचारपुस झाल्यावर मीच रस्त्याचा विषय काढला. दोन दिवस आधी पर्यंत संध्याकाळी पाऊस होता त्यामुळे ही अवस्था. तसेच कोपरे ते फोफसंडी हा रस्ता पुर्णपणे वनविभागाच्या अख्यरित असल्याने मंजुरी मिळणं अवघड. कोपरे पुणे जिल्ह्यात तर फोफसंडी नगर जिल्ह्यात. वाटेत लागलेला तो देवनाळ्याचा पूल ही पुणे व नगर जिल्ह्याची सीमा. जर पक्का रस्ता झाला तर कोपरे ओतुर मार्गे इथून माळशेज घाट अगदी जवळ होईल..असो.
कुंजरगड माझ्या नियोजनात नव्हता. त्या पेक्षा निरोळी रांजणा सारखी अजून काही अल्प परिचित ठिकाणं जाणुन घ्यायची होती. मुठे काकांनी माहितीचे भंडार उघडले. नवी जुनी काही कागदपत्र माहिती पत्रे दाखवली. फोफसंडी हे अतिशय दुर्गम असे चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले दर्या खोर्यात वसलेले १०००-१२०० लोकवस्तीचे लहानसे गाव. अशा या भौगोलिक स्थानामुळे इथे सुर्योदय काहीसा उशिरा तर सूर्यास्त लवकर होतो. पावसाळी शेती त्यात तांदूळ, नाचणी, वरई तसेच हिरडा सारख्या वनस्पतीची विक्री आणि जोडीला थोडे फार पशूधन हेच काय उपजीविकेचे साधणं.
गावच्या नावामागची कहाणी मोठी रंजक आहे. साधारण १९२५ च्या सुमारास संगमनेर प्रांतचे इंग्रज अधिकारी मपोपफ हे घोड्यावर फिरत फिरत अनेक लहान मोठे डोंगर पार करुन या दरीत उतरले. त्या वेळी होती तुरळक आदिवासी वस्ती. पोप साहेबाला इथला निसर्ग खुप आवडला. इतका की तो दर रविवारी इथे येऊ लागला. या भागात उगम पावणारी मांडवी नदी जिच्यावर आता चिल्हेवाडी धरण बांधण्यात आले आहे त्या नदी तिरावरील टेकडीवर रेस्ट हाऊस बांधले. तिथून तो इथल्या डोंगर रांगा कुंजरगड, पावसाळ्यात डोळ्यांचं पारण फेडणारे रूप अनेक धबधबे पाहत असे. पोपच्या रहण्याने या गावला मपोफसंडी म्हणू लागले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रुढ झाले. गाव तसे सुविधा पासून वंचित. रस्ते, वीज, शाळा यांची वानवा. शिकायला दूर आश्रम शाळेत. २००४-५ नंतर वीज व रस्ते आले. त्यात ही स्थानिक मंडळी यांचे सहभाग व श्रमदान महत्वाचं. दत्तात्रय मुठे काकांनी त्या साठी शासन दरबारी बरीच पायपीट केली. सध्या गावात अकोलेहून सायंकाळी मुक्कामी एस्टी येते. लवकरच दहावी पर्यंत शाळा होणार. आरोग्य सुविधा तसेच शेतीला पुरक व्यवस्था व पर्यटनावर भार द्यायचा त्यांचा मानस आहे. काकांनी ही सारी माहिती दिली.
मला खिरेश्वर कोल्हेवाडी कडील भाग पहायचा होता. वेळ पहाता निरोळी रांजणा दोन्ही होणं शक्य नव्हते. त्यामुळे मानखंदा व खिरेश्वर भागात उतरणारया पुरातन वाटा पाहायचा हे काकांसोबत चर्चा करुन ठरवलं. जुन्या वाटा म्हंटल की आमची उत्सुकता वाढते. काकांचे भाऊ ‘देवराम’ सोबत यायला तयार झाले. पुन्हा देवनाळ्या जवळ आलो.
तिथेच डावीकडे या भागातला मोठा घारीचा धबधबा, सध्या बारीक धार सुरु होती. तिथं न जाता पुलाच्या डावीकडून वर चढायला सुरुवात केली. धापा टाकत वरच्या टेपाड वर आलो. काही वेळ आडव जात पुन्हा आणखी एका मोठ्या टेकडीला वळसा घालून भल्या मोठ्या गवताळ पठारावर आलो.
उजवीकडे दरी पल्याड जीतवाना धबधबा. पठारावर काही अंतर जात वायव्य दिशेला हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला डोकावला.
रोहिदास तारामतीवर काहिसं धुकं पसरलं होतं. झटपट पावलं टाकत कड्यावर आलो, धावतच जात टोकावर उभा राहिलो. इथून उलगडला तो पुर्ण माळशेज परिसराचा देखावा. वातावरण थोडं धुसर, धुप छाव टाईप, तरी डोळ्यांना व्यवस्थीत दिसत होते.
खाली पिंपळगाव जोगा धरणाचा फुगवटा त्या काठी वसलेल्या गवारवाडी, वाघाचीवाडी, कोल्हेवाडी इतर वाडी वस्त्या, दूरवर खिरेश्वर, खुबी पर्यंत जाणारी धरणाची भिंत, त्या पल्याड माळशेज, नाणेघाट पासून देवदांड्या, भोजगिरी, गुण्या, उधळ्या डोंगर ते सिंदोळा, हडसर, गणेशखिंड पासून दक्षिणेला हाटकेश्वर पर्यंत. तसे पाहिले तर ही हरिश्चंद्रगड पासून निघालेली बालाघाट पर्वतरांग हरिश्चंद्रगड कारकाई बाळूबाई तिकडे पूर्वेला भैरोबा दुर्ग कुंजरगड तर नैऋत्यला वारल्याचा डोंगर निरोळी पासून पार रांजणा पर्यंत.. खिरेश्वर पिंपळ्गाव जोगा धरणा जवळून हि रांग भलतीच मोहक दिसते. याच खिरेश्वरहून फोफसंडी भागात येणार्या वाटांबद्दल कुतूहल होते. अशाच एका जुन्या टकोरीची खिंड या वाटेवर आम्ही निघालो. आता आम्ही होतो तो मानखंदा याच्या उजव्या बाजूला निरोळी तर डावीकडे रांजणा म्हणजे दोन्ही परस्पर विरुध्द बाजूला. टकोरीची खिंड ही निरोळीच्या दिशेला.
पठारावरून क्रेस्ट लाईन पकडून चालू पडलो. अजूनही बहुतेक ठिकाणी ओढ्यात वाहत पाणी. अवाढव्य पसरलेल्या या पठारावरील डोंगरकडेला सदाहरीत जंगल चांगलेच बहरलेले जांभूळ, अंजन, बेहडा, हिरडा तसेच निवडुंग व करवंदांच्या जाळीची गर्दी. कातळ टप्प्यात अनेक ठिकाणी निसर्ग निर्मित लहान मोठ्या गुहा. या कुंजरगड फोफसंडी परिसराचे एकंदरीत वनक्षेत्र एकूण १९०० हेक्टर एवढं आहे. पाऊण तासात मोठ्या झाडीभरल्या खिंडीजवळ आलो.
;हिच टकोरीची खिंड, या वाटेने खाली खिरेश्वर गावाजवळील वाघाची वाडी येथे जाता येते. तेथील मंडळी या भागात सोयरीक असल्याने काही कार्य किंवा कामानिमित्त अजूनही याच वाटांनी ये जा करतात. गाडी रस्त्याचा फेर आणि लागणारा वेळ पाहता ही वाट कधीही सोयीची. याच खिंडी मागचा आणखी एक डोंगर चढून गेल्यावर उंबारल्याची टेकडी तिथून उंबारल्याची वाट खाली दुसर्या कोल्हेवाडीत उतरते. हि झाली फोफसंडीतून खिरेश्वर भागात उतरणारी दुसरी वाट.
;;आता आम्ही आल्यापावली मागे फिरलो ती फोफसंडीतील सर्वात जास्त वापरली जाणारी अगदी अबाल वृध्दांपासून लहान मोठे ते गुर ढोरं ने आण करण्या योग्य असलेल्या गायदरा घाटाच्या वाटेला. पुन्हा मानखंदा येऊन रांजणाच्या दिशेनं निघालो. दोन मोठे टेपाड चढून गायदराच्या खिंडीत आलो.
अगदी पध्दतशीर पणे मळलेली घाटाची वळणं वळणं घेत उतरलेली लयबध्द वाट. काही अंतर खाली घाटाने खाली जाऊन पुन्हा वर आलो. नव्वदच्या दशकात पिंपळगाव जोगा धरण बांधण्यात आले. त्या वेळी मढ खुबी भागातील लहान लहान गावं विस्थपित झाली. पुर्वी फोफसंडीत गाडी रस्ता नव्हता तेव्हा अगदी अलिकडच्या काही वर्षांपर्यंत या मंडळीचा वाण समान बाजारासाठी मढ भागात येण्यासाठी हाच घाट वापरता होता. या तिन्ही घाटवाटेची खिरेश्वर कोल्हेवाडी भागातून चढाई उतराई १५०० ते १८०० फूट सहज असेल.
गायदरा अलिकडच्या पठारावर एक म्हातारा आजा गुरे चारत होता. मला देवा सोबत पाहून, "काय पाव्हण ? कुठलं तुम्ही ?" चौकशी सुरु.... मग जुन्या काळच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. "अंगा खांद्यावर ३०-४० किलोची ओझी वाहत या वाटेने आम्ही जायचो, आमची सारी हयात गेली. आताची पोरं नुसतं एवढं चालायची बी नाय." म्हसाच्या यात्रेवेळी गुर घेऊन या गायदराने उतरुन पुढे खुबी मग जुन्या माळशेज घाटाने सावर्नेत पहिला मुक्काम दुसरा धसईत मग तिसर्या दिवशी म्हसा पोहचत. हे सारं सांगताना आजाच्या डोळ्यात चांगलीच चमक होती. खरचं पुर्वापार वहीवाटेतल्या या वाटा.
एके ठिकाणी पाणवठा पाहून जेवणाला थांबलो, जेवण अर्थातच घरून आणलेलं. थोडा वेळ विसावा घेऊन उतरणीला लागलो. वारल्याच्या डोंगरा वरुन सरळ नजर फिरवत कुंजरगडाचे वेगळ्या कोनातून दर्शन झाले. समोर माथ्यावर मंदीर असलेला बर्डीनाथ महादेव, आजूबाजूच्या लहान वाडीवस्तीतील लोकांची महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.
अडीच पावणेतीनच्या सुमारास खाली आलो. मुठे काकांसोबत चहा झाला. काकांनी पुन्हा या भागातील बघण्यालायक ठिकाणांची नाव सांगितली. फोफसंडीचे कुलदैवत दर्याबाई मंदीर. गावापासून ४ किमी अंतरावर असलेले राणुबाई मंदिर त्याच्या आसपास मोठ मोठ्या गुहा. तसेच रानात वसलेले ग्रामदैवत कळमजाई मंदीर. ज्यावरुन नदीला नाव पडले त्या मांडवी हृषिनी तप केले ती घोडगडद नावाची गुहा. घारीचा, धुळगडीचा, कावडाच्या, भदभड्याचा इ अनेक लहान मोठे धबधबे. चारण गडद, गहीन्याची गडद इ अनेक मोठ मोठ्या गुहा. खरचं हे सारं पहायच असेल तर पायगाडीला पर्याय नाही, प्रत्येक ठिकाण पाऊण ते तासभराच्या अंतरावर टप्पा टप्प्यांत केलेला छोटा ट्रेकच. या साठी तीन चार दिवसांची सवड काढून नक्की येणार. मुठे काका व देवराम यांचा निरोप घेऊन दुपारी साडेतीन वाजता निघालो. नियोजनाप्रमाणे परतीला कोतुळ ब्राम्हणवाडा ओतुर माळशेज घाट असेच ठरवलं होतं. देवराम म्हणाला होता सातेवाडी पाझर तलाव कडून एक कच्चा रस्ता थेट मुथाळणे ला निघतो. पुन्हा कच्चा रस्ताची परिक्षा मला नको होती, त्यामुळे ठरल्याप्रमाणे निघालो.
फोफसंडी ते पळसुंदे कोतुळ हा रस्ता ही पुर्ण घाटाचा अनेक चढ उतार व तीव्र वळणावळणचा डोंगर दरी लहान लहान वाडी वस्त्या, ओढे नाले बंधारे या दिवसात तर आणखीनच उठून दिसणारे जणू चित्र वाटावे असे देखावे. सहाजिकच कुठे थांबू कुठे नाही अशी अवस्था. अर्ध्या पाऊण तासात आरामात पळसुंदेच्या भैरोबाला थांबलो. इथून कोतुळ ६ ते ७ किमी. फोफसंडी सोडल्यापासून बरोबर तासाभरात कोतुळ गाठले, तिथून उजवी मारुन ब्राम्हणवाडा पुढे घाट ओलांडून ओतुर. हा रस्ता राज्य महामार्ग असुनही यथा तथाच. आणखी एक गोष्ट जाणवली म्हणजे या भागात उसा व्यतिरीक्त गहू, बाजरी, मका, त्यात कांद्याचे प्रमाण लक्षणीय, परतीचा पावसाने मात्र त्याची भलतीच हानी इथं केलेली दिसली. दसरा आल्यामुळे फुलांची रास तेवढी जागोजागी दिसली.असो.. ओतुरहून माळशेज हायवेला लागलो. करंजाड खिंड ओलांडून पुन्हा पिंपळ्गाव जोगा धरणाचा फुगवटा दिसला, त्या पलिकडे हिच हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. जवळून पाहिलेल्या रांजणाचे पुन्हा एकवार दर्शन झाले. सायंकाळच्या सोनेरी उन्हात ही पुर्ण रांग खुलून दिसत होती. बराच वेळ ते पाहतच खुबीफाट्याला कडक चहा घेतला. तिथून पुढे सव्वादोन तासात सुंदर दिवसाची सांगता करुन नॉनस्टॉप घरी. अर्थात बाईकने दिलेल्या दमदार साथीमुळे हे शक्य झाले त्यामुळे तिचा उल्लेख करुन कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.http://ahireyogesh.blogspot.com/2020/11/phopsondi.html
योगेश चंद्रकांत आहिरे..कुजंरगड कोंबडकिल्ला Kombadkilla Kunjargad
कुजंरगड किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो.
हरीशचंद्र गडाच्या मागच्या बाजूस येणार्यात या डोंगररांगेवर कलाल, कुंजर, भैरवगड इत्यादी किल्ले येतात. “कुंज” या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन “कुजंरगड” असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
विहिर या कुंजरगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी २ वाटा आहेत.
त्यातील गड व त्याच्या उजव्या बाजूचा डोंगर यांच्या मधून जाणार्याा वाटेने
गडावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो आणि गडावरील सर्व अवशेष ही पाहता येतात.
या वाटेने गडावर चढतांना साधारणत: गडाच्या पाऊण उंचीवर एक वाट डावीकडे
वळते. या वाटेने गडाला वळसा घालून जातांना वाटेत दाट झाडीत उघड्यावर
ठेवलेल्या दोन मूर्ती पाहायला मिळतात. त्यातील एक मुर्ती हनुमानाची असून
दुसर्याय मुर्तीला काळोबा म्हणतात. या मूर्त्या येथून हलवून गावात नेऊन
मंदिर बांधण्याचा गावकर्यां चा मानस होता, परंतु त्यांना हलवणे आज पर्यंत
शक्य झाले नाही, अशी कथा गावकरी सांगतात. कुंजरगडावर शिवाजी राजांनी
मुक्काम केल्याची इ.स.१६७० मधील नोंद आहे. गडाची तटबंदी, वाड्याचे अवशेष,
पाण्याची टाकी, घरांची जोती असे गडपणाचे अवशेष पहायला मिळतात. गडाच्या
माथ्यावरुन मुळा नदीचे खोरे विस्तृत दिसते. हरिश्चंद्रगड, कलाड, आजोबा,
घनचक्कर, भैरवगड तसेच कळसूबाई रांगही दिसते.पायऱ्या उतरल्यावर तसेच थोडे
पुढे गेल्यावर कातळात कोरलेली गुहा लागते. गुहेच्या आतल्या कोपर्यातत एक
सापट तयार झाली आहे. विजेर्यांधच्या उजेडात सावधगिरीने या सापटीत शिरावे
लागते. सुरवातीला काही अंतर रांगत जावून नंतर झोपून डावीकडे वळावे लागते.
जमीनीलगत असलेल्या लहान भोकातून डोके आत घालून सर्व शरीर आत ओढून घ्यावे
लागते. येथून आत शिरल्यावर पुढे हे भोक मोठे होत जाते. भोकाच्या टोकाला चार
पाच जण उभे राहू शकतात. हे भोक कुंजरगडाच्या कड्यावर उघडत असल्याने येथून
खालची दरी आणि निसर्ग उत्तम दिसतो. गडावर राहण्याची सोय नाही, परंतु तंबू
किंवा तत्सम साहित्य नेल्यास मुक्काम करता येतो. गडावर पाण्याची टाकी असून
हिवाळ्याच्या शेवटपर्यंत पाणी उपलब्ध असते. या मुर्ती पाहून मागे न जाता
कड्याला लागून असलेल्या वाटेवरुन कारवीच्या दाट झाडीतून किल्ल्यावर जाता
येते किंवा परत मागे फिरुन आलेल्या वाटेने दोन डोंगरामधील खिंडीतून गडावर
जाता येते. पहिल्या मार्गाने डोंगराला पूर्ण वळसा घालून आपण विहिर गावाच्या
विरुध्द बाजूस पोहोचतो. या बाजूला फोफसंडी गावाकडून येणारी वाट येऊन
मिळते. किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या
पायर्याब आहेत. अर्ध्या पायर्या चढल्यावर एक गुहा आहे, या गुहेचे
वैशिष्ट्य म्हणजे ती डोंगराच्या आरपार खोदलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी
विहिर गावच्या दिशेला व फोफसंडी गावाच्या बाजूस लक्ष ठेवणे शक्य होत असे.
पावसाळ्यात व कडाक्याच्या थंडीत / उन्हात या गुहेचा चांगला उपयोग होत
असावा. हि गुहा पाहुन पायर्यां च्या मार्गाने उध्वस्त प्रवेशव्दारातून आपण
गडावर प्रवेश करतो. समोरच आपल्याला उध्वस्त वास्तुचे अवषेश दिसतात. प्रथम
उजव्या बाजूला गेल्यावर पाण्याची सुकलेली २ टाकी दिसतात. या बाजूला
किल्लाच्या माथ्यावरील पठार अरुंद होत जाते, टोकावरून दुरवरचा प्रदेश
नजरेच्या टप्प्यात येतो. इथुन पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन विरुध्द
(डाव्या बाजूच्या) टोकाकडे जातांना वाटेत पाण्याची ३ सुकलेली टाकी दिसतात.
पुढे एका मोठ्या वाड्याचे अवषेश दिसतात.या वाड्यामागे (पिण्याच्या
पाण्याच्या) दगडात कोरलेल्या टाक्यांचा समुह आहे. येथून प्रवेशव्दारापाशी
परत आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. येथुन आलेल्या वाटेने परत न जाता सरळ
जाता गडाला (उजव्या बाजुला) लागुन असणार्याे डोंगरावर जावे. या डोंगरावर ३
नैसर्गिक गुहा आहेत. गावकरी या गुहांचा उपयोग आपली गुरे बांधण्यासाठी
करतात.या गुहा पाहुन डोंगर उतरुन विहिर गावात जाता येते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
१) विहिर गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास लागतात.
२) फोफसंडी गावातून कुंजरगडावर जाण्यास २ तास लागतात.
डोंगररांग- बालाघाट डोंगररांग
किल्ल्याला भेट द्यायला कसे जाल?
किल्ल्यावर प्रवेश करताना-
गडावर पोहोचल्याशिवाय मध्ये कोठेही पाण्याची व्यवस्था नाहीये आणि कदाचित उन्हाळ्यात गडावर देखील पिण्यायोग्य पाणी मिळणार नाही. गडाची चढाई थोडी थकवणारी असल्यामुळे शक्यतो पाठीवर जास्त वजन घेऊन न जाता आपल्या पिशव्या गडपायथ्याला असलेल्या झापांमध्ये ठेऊन मग चढण्यास सुरुवात करावी.विहीर गावाच्या मार्गाने आपण गडावर पोहोचुयात. विहीर गावात उतरल्यावर गावाच्या मागेच आपल्याला आडवा पसरलेला कुंजरगडाचा डोंगर दृष्टीक्षेपात पडतो. विहीर गावातील शाळेसमोरून शेतीवाडीतून एक पायवाट गडाकडे जाते. त्या वाटेने आपण चालू लागायचं. एका तासाच्या पायपिटीनंतर आपण गडाच्या पायथ्याला असलेल्या झापांजवळ येऊन पोहोचतो. आता आपला प्रवास या गच्च भरलेल्या कारवितील वाटेने सुरु होतो. हि खडी चढाई पार करायला पाऊन ते एक तास लागतो आणि आपण खिंडीत येऊन पोहोचतो.आपल्या डाव्या हाताला आता कुंजरगड आहे. आत्तापर्यंत आपण जी खडी चढाई केली ती या खिंडीतून खाली आलेल्या दगडांवर सफर करत आलोय. आता खिंडीतून खाली जाण्यासाठी एक वाट आहे. हि वाट फोफसुंडी गावात जाते, आपण जर फोफसुंडी गावातून प्रवासाला सुरुवात केली तर आपली भेट इथेच होईल.
आता आपण डाव्या हाताच्या पायवाटेने चालायला लागायचे. या वाटेने जाताना आपल्याला एका बाजूला कुंजरगड आणि दुसऱ्या बाजूला दरी ठेवत तिरकी चाल करत आपण पुढे जात राहायचे. या वाटेने आपण गडाच्या अगदी जवळ येऊन पोहोचतो. गडाचे चार कातळटप्प्यात आहे. शेवटच्या टप्प्यावर गडमाथा आहे. आपण दोन कातळटप्पे चढून तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोहोचतो.येथे एका झाडाखाली तुरबत, दगडी घुमट आणि अनेक भगवे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात.
याच्याच मागे असलेल्या टेकडीच्या माथ्यावर एकसलग अशी तटबंदी आपल्याला पाहायला मिळेल. गडाचा हा तिसरा टप्पा पाहून गडाचा मुख्य माथा डाव्या हातालाब ठेवत वर जाणाऱ्या पायवाटेने चढत राहायचे. याच वाटेवर एक यु-टर्न मारल्यावर गडाच्या अंतिम टप्प्यासाठी कातळात खोदलेल्या अरुंद पायऱ्या जवळ आपण येऊन पोहोचतो. या पायऱ्यांनी पुढे गेल्यावर आपल्याला गडावर एका भग्न दरवाजातून प्रवेश करावा लागतो.
गडावर पोहोचल्यावर आपल्याला गडाच्या भव्यतेचा अंदाज येतो. गड लांबलचक पण अरुंद असा आहे. आपण डाव्या हाताला जाऊन गडाच्या पूर्वेकडील बाजूला असलेल्या कातळकोरीव टाक्यावर पोहोचायचे. या टाक्यात खाली उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत व एका बाजूने जादा झालेले पाणी बाहेर टाकण्यासाठी एक खाच देखील मारलेली आहे. या टाक्यातील पाणी कधी कधी पिण्यायोग्य असू शकते पण याची खात्री देता येत नाही.
हे टाके पाहून आपण गडाच्या निमुळत्या सोंडेसारख्या दिसणाऱ्या टोकाकडे जायचे. वाटेत आपल्याला अनेक पाण्याची टाकी लागतात परंतु त्यांचे पाणी पिण्यायोग्य मुळीच नाहीये. वाटेत एक भुयारासारखी रचना आपल्याला दिसते. रतनगडावरील गुप्त टाक्याची आठवण येते. परंतु यात आतमध्ये थोडेफार पाणी असले तरी हे टाके नसून गुहा आहे यात गणेशाची मूर्ती आहे असे भटके सांगतात. गडाच्या या टोकावर एकसलग अशी तटबंदी बघायला मिळते.
गडाची हि बाजू पाहून झाल्यावर गडाच्या वरील एका उंच भूभागावर आपण पोहोचायचं. आपल्याला येथे एक पाण्याचे टाके दिसते त्यात मध्ये बांध घातलेला आहे. या टाक्यांच्या समोरच उघड्यावर असलेले शिवलिंग आणि नंदी आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण बालेकिल्ल्यावर आहोत, येथे आपल्याला भव्य अशा राजवाड्याच्या इमारतीच्या चौथऱ्याचे अवशेष बघायला मिळतात. वाड्याच्या पायऱ्या आणि काही इमारतींच्या आतील देवळ्या असे अवशेष आजही मोडकळीला आलेल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतात. पुढे आपल्याला हनुमंताचे एक भग्न शिल्प बघायला मिळते व इथेच एक भव्य असा पाण्याचा तलाव आहे. त्यातील पाणी कायम गढूळ वाटते म्हणून कदाचित याला गढूळ पाण्याचा तलाव बरेच भटके म्हणतात.
आता गडावरील सर्वात आकर्षक अशा गुहे कडे जायचे. हि गुहा म्हणजे कुंजरगडाच्या दोन्ही बाजूच्या गावांवर लक्ष ठेवण्यासाठी असलेली गुहा. या गुहेच्या तोंडाला खूप मोठी जागा आहे पण जर आपल्याला दुसऱ्या बाजूपर्यंत पोहोचायचे झाल्यास काही वेळा गुडघ्यावर तर काहीवेळा सरपटत पुढे जावे लागते. पण दुसऱ्या टोकाला पोहोचून तिथे उभे राहुन काहीतरी वेगळ केल्याचा आनंद हा मनाला समाधान देऊन जातो. (हे सर्व करत असताना विजेरीची सोबत असणे गरजेचे आहे)
गडावर हे सर्व वैभव बघितल्यानंतर आपण आपल्या मार्गाला लागायचे. गड उतरायला सुरुवात करायची. गडावर शक्यतो पाणी नसते त्यामुळे इथे कॅम्पिंग चा विचार स्वताच्या जबाबदारीवर घ्यावा.


































3.jpg)













































































































खूप छान माहिती