Thursday, October 20, 2022

शिरपुंजेचा भैरवगड

हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत. दुर्ग भटक्यांनी या वाटा कधी ना कधी तरी तुडवलेल्या असतात. या हरिश्चंद्रगडाच्या परीसरात या किल्ल्याकडे येणाऱ्या विविध मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी प्राचीन काळी कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड (कोथळे), कलाडगड, भैरवगड (शिरपुंजे) हे किल्ले बांधले गेले. या चार गिरिदुर्गापैकी राजुरमार्गे हरीश्चंद्रगडावर येणाऱ्या वाटेवर तसेच मुळा नदीच्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंजे आणि कुमशेत या गावांच्या मध्ये भैरवगड हा टेहळणीचा किल्ला बांधला गेला. भैरवगडावरील भैरोबा हे स्थानिक लोकांचे दैवत असुन येथे हा गड भैरोबागड म्हणून ओळखला जातो. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. दरवर्षी अश्विन महिन्यात या भैरोबाची यात्रा भरते.
    हरीशचंद्रगडाच्या प्रभावळीत असलेल्या कुंजरगड (कोंबडगड) , भैरवगड (कोथळे) , कलाडगड , भैरवगड (शिरपुंजे) या किल्ल्यांवर फ़ारच कमी दुर्ग भटके जातात. महाराष्ट्रात एकुण ६ भैरवगड आहेत. त्यापैकी २ भैरवगड हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडी मार्गे येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे . तर राजुर मार्गे येणार्‍या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे. 
 डोंगरयात्रा करताना गिरिशिखरांची चढाई करताना, निबिड अरण्यातल्या वाटा तुडवताना अनेक देव-देवतांचे आपल्याला दर्शन घडते. अन्य देवदेवतांच्या नावे नसणारे काही गडकोट मात्र या भैरवदेवाच्या नावाने ओळखले जातात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याला निसर्गाचे वरदान आणि सह्याद्रीच्या गडकोटांचे कोंदण लाभले आहे. लोभस भंडारदऱ्याच्या धरणाच्या अवतीभोवती नांदणारे गड म्हणजे सह्याद्रीभक्तांचे जीव की प्राण. या तालुक्यात कोणत्याही ऋतूत आणि कोणत्याही दिवशी या, इथला निसर्ग तुम्हाला वेड लावल्याशिवाय राहणार नाही. इथल्या शिरपुंजे गावात असंच एक गडरत्न उभे आहे. हे रत्न संपूर्ण पंचक्रोशीतल्या भाविकांचं श्रद्धास्थान असून क्षेत्र भैरवगड म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळेच इथे नेहमीच वर्दळ असते. या वर्दळीतल्या काहींना ध्यास दर्शनाचा, तर काहींना डोंगरचढाईचा. या सगळ्यात समान धागा एकच भैरवगडाचा माथा.
जर या परिसरात भटकंती करुन मुळा खोर्यातील सर्व गड बघायचे असल्यास, शिरपुंजे गावात मुक्कामाची वेळ आली तर गावाजवळ असलेल्या आश्रमशाळेत चांगली सोय होते. 
 
 
   शिरपुंजे गावातून दिसणारा भैरवगड

मुंबईहुन दोन मार्गाने शिरपुंजे या भैरवगडाच्या पायथ्याच्या गावी जाता येते.
१) मुंबई नगर महामार्गावर कल्याण, मुरबाड, माळशेज घाट मार्गे १५९ किमी वरील ओतुर गाठावे. ओतुर बस स्थानकाच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा मार्गे ३० किमी वरील कोतुळ गावात जातो. कोतुळहुन कोतुळ राजुर रस्त्यावर विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (कोळथेच्या भैरवगडाच्या पायथ्याचे गाव अंतर २५ किमी) गाठावे. कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे. (खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो.हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे. (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.
   २) मुंबई नाशिक महामार्गावर घोटी पर्यंत जावे. घोटीहुन भंडारदरा मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) गाठावे. राजुरहुन कोतुळला जाणार्‍या रस्त्यावर राजुरपासुन ४ किमीवर माणिक ओझर हे गाव आहे.माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.
       ३) कोथळेचा भैरवगड किल्ला पाहून किंवा पाचनई वरुन भैरवगड शिरपुंजेला जाणार असल्यास कोतुळ - राजुरला रस्त्यावर कोथळेच्या पुढे खडकी गाव आहे. (खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो. हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे . (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. या गावाच्या आधी नदीवरील पुल लागतो. पुल ओलांडल्यावर लगेच डाव्या बाजुस एक रस्ता वर चढताना दिसतो. येथे "कळसुबाई हरीशचंद्र अभायारण्य" अशी पाटीही लावली आहे. हा रस्ता थेट भैरवगडाच्या पायथ्या पर्यंत जातो. जीप सारखे वाहान पायथ्यापर्यंत जाते.
४) पुण्यातून भैरवगडाला जायचे असल्यास राजुर गाठणे आवश्यक आहे.राजुरला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.पुणे-नाशिक रोडवरील संगमनेरला जाउन तिथून अकोलेमार्गे राजुरला जाणे हा एक पर्याय.किंवा पुणे-नाशिक रस्त्यावरील आळेफाट्यावरुन ओतुर-ब्राम्हणवाडा-कोतुळ मार्गे राजुरला जाणे हा दुसरा पर्याय आहे.राजुरवरुन भैरवगडाच्या पायथ्याच्या आंबितला जाण्यासाठी एसटी बस आणि जीपची सोय आहे. त्याने शिरपुंजेच्या फ़ाट्यावर उतरुन चालत गडपायथा गाठण्यास पाउण तास लागतो.
     भैरवगडावर चढाईचे दोन मार्ग आहेत.
१) भैरवगडाच्या उत्तरेला शिरपुंजे गाव आहे.या गावातून सुघड, नीट पायर्या असलेली आणि रुळलेली वाट गडावर जाते.आपण या वाटेने चढाई करणार आहोत.
२) दुसरी वाट गडाच्या दक्षिण अंगाला असणार्या आंबित गावातून आहे.जर या मुळा खोर्यातील गडभ्रमंती करण्यासाठी आपण हरिश्चंद्रगडाच्या टोलार खिंडीतून उत्तरेला उतरुन आलो किंवा या परिसरातील गड दक्षिणेकडून बघायला सुरवात केली म्हणजे आधी कुंजरगड्,कलाडगड बघून हा शिरपुंजेजवळचा भैरवगड बघण्याचे नियोजन केले तर सहाजिकच गडाच्या दक्षिण बाजुने म्हणजे आंबितकडून चढणार्या वाटेने गडमाथा गाठून शिरपुंजेकडे म्हणजे उत्तर बाजुकडे उतरता येईल. यासाठी राजुर-पाचनई मार्गावरील आंबित गाव गाठायचे.राजुरवरुन आंबितला थेट एस.टी. बस सेवा आहे.हि बस अकोले या तालुक्याच्या गाव्तून सुटते.अकोलेहून पाचनईला संध्याकाळी ६ वा. मुक्कामी बस आहे.कोथळेसाठी सकाळी १०.३० व संध्याकाळी ५,३० ला मुक्कामी बस आहे. आंबितला सकाळी ११ वा. तर कुमशेतला राजुरवरुन संध्याकाळी ५,३० ला मुक्कामी बस आहे. याशिवाय शिरपुंजेला सकाळी ११ वा व दुपारी ३.३० एस.टी. बस आहे.अर्थात बसची खात्री नाही, तसेच या मार्गावर खाजगी जीपही तुरळक असतात.त्यामुळे या परिसरातील भटकंतीला स्वतःच्या वहानाशिवाय पर्याय नाही. 

 

 आंबित गावातून दिसणारा भैरवगड
 
  आंबितवरुन भैरवगडाकडे निघायचे.वाटेत कुमशेत-राजुर रस्ता लागतो. समोर अस्ताव्यस्त पसरलेला घनचक्कर डोंगर आणि त्याच्या कड्याआडून डोकावणारा भैरवगडाचा कडा दिसतो. या रत्स्याने वीस-पंचवीस मिनीटे चाल झाली कि डाव्या बाजुला भैरवगड आणि घनचक्कर यामधील खिंड दिसते. रत्स्यावरुन चालत त्या खिंडीच्या तळाशी पोहचायचे. थोड आशी डावीकडे फुटणार्या पायवाटेवर वळायचे. थोड्या अंतरावर तीन -चार घरे लागतात. या घरापासून टेकाड चढत खिंडीकडे मोर्चा वळवायचा. 
भैरवगडाच्या कातळकोरीव पायऱ्याआधी लागणारी खिंड आणि तीमधून दिसणारं आंबित गाव आणि निसर्गपरिसर 
दहा मिनीटात खिंडीतून ओघळलेल्या घळीच्या पायथ्याशी पोहचायचे. घळीच्या दगडाच्या लहान मोठ्या पायर्या करत अर्ध्या तासात ३५० मीटर उंचीची हि खिंड सर करायची. खिंडीतून पाच मिनीटात खोदीव पायर्यानी भैरवगडाचा माथा गाठायचा. 

 शिरपुंजे गाव आणि पार्श्वभुमीवर भैरवगडाचा डोंगर

    आवश्यक ती सर्व माहिती घेतल्यावर आपण भैरवगडावर शिरपुंजेमार्गे चढाई करणार आहोत.या भागात वाहनांची सोय नसल्याने स्वतःचे वाहन असेल तर उत्तम शिवाय थेट गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते. येथुन भैरवगडाच्या मधल्या आणि उजवीकडच्या कातळकडय़ाच्या मधोमध भैरोबाची गुहा, बाहेरचा कठडा व गुहेवर फडकणारे झेंडे दिसुन येतात. local guide (Ramnath: 9762105585). 
 
 
 
 

भैरवगड

भैरवगडावरील मंदिर

 

शिरपुंजे गावात मुकाई देवीचे मंदीर आहे. या देवीला होळी, विवाह प्रसंग आणि अर्थातच जत्रा या काळात महत्व असते. शिरपुंजे गावाचे वैशिष्त्य म्हणजे इथले बहुतेक लोक धिंडले आडनावाचे आहेत.  
    डोंगरांच्या कुशीत अलगद पहुडलेल्या या देखण्या शिरपुंजे गावातून भैरवगडाकडे अत्यंत प्रशस्त आणि मळलेली वाट गेली आहे. थोडी मान वर करून पाहिले, तर तीन डोंगरांच्या नाकाडाच्या मध्ये शिखरापाशी भैरवाची गुहा अन् वाऱ्याच्या झोतासरशी फडकणारे झेंडे दिसतील. हीच ती ओळखीची खूण आणि आपले लक्ष्य. मग आपण चालू लागतो वाट ती थेट भैरवाकडेच. रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या  इमारतीपासून  पासून शेतांमधून जाणारी पायवाटेने २ कि मी चालून  नंतर एक वाट डावीकडे वरती जायला लागते एक रस्ता भैरोबा म्हणजेच भैरवगड(या गावात फक्त भैरोबा चा डोंगरावर कसे जायचे हे विचारावे ) आणि दुसरा रस्ता घनचक्कर(१५३२ मिटर) या महाराष्ट्रातील तिसर्या क्रमांकाचे उंचीचे डोंगलाला एक वाट जाते (भैरवगड आणि घनचक्कर डोंगर जोडून असलेले डोंगर आहेत पण भैरव गडावरून घनचक्करला जायला वाट नाही. दोन डोंगरांना एका खिंडने   विभागले आहे .जर तुम्हाला घनचक्कर वरती जायचे असेल तर भैरवगड पूर्ण उतरून शिरपुंजे गावात परत यायला पाहिजे  आणि शिरपुंजे वाडीतून घनचक्कर चा एक उतरणारा दांड चढून पठारावर जायला लागते.वाट हि कायम दाट झाडीतून आणि कारवीच्या रानातून असल्यामुळे उन्हाचा विशेष त्रास होत नाही (हा भाग कळसुबाई हरिश्चंद्रगड अभय अरण्यात येत असल्यामुळे येथे बेहडा ,जांभूळ , हिरडा , आवळा , जंगली लिंबू ,करवंद इत्यादींचे झाडी फार मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच वन्य प्राण्यांमध्ये पांढर्या रंगाचे वानर सहज दिसते पण या भागात बिबटे दिसणे म्हणजे दुर्मिळ गोष्ट कारण जरी दाट झाडी आहेत पण बिबट्या साठी भक्ष फार कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे येथे बिबटे सहसा दिसत नाहीत पण सर्प जातीतील अजगर या भागात सापडल्याची नोंद आहे असे स्थानिक ग्रामस्थ सांगत ) 

गावातून शेतं तुडवत दहा मिनिटांच्या आत  स्वागतकमानीपाशी पोहोचता येतं. वाहनतळाशेजारी वनखात्याने सिमेंटचा निवारा बांधलेला असुन समोरच श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान, शिरपुंजे असे लिहिलेली लोखंडी कमान आहे. 
 
 

या कमानीपासून काही बांधीव तसेच काही कातळकोरीव पायऱ्या चढुन व तासभर नागमोडी खडी चढाई करून आपण वनखात्याने लावलेल्या लोखंडी कठड्यापाशी येतो.विजेचे खांब असलेला रस्ता धरून चालत रहायचं. वेडीवाकडी वळणं घेत वाट धावत राहते. मध्ये कातळात खोदलेल्या पायऱ्या मार्ग सुकर करतात. भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत असल्यामुळे भैरववगडावर जाण्याची वाट व्यवस्थित मळलेली आहे..
 

 

भैरवच्या वाटेवर

 
भैरवगडाकडे जाणारा मधल्या टप्प्यातील पायरीमार्ग आणि त्याबाजूचे कठडे 
 हे कठडे पार केल्यावर आपण भैरवगड आणि शेजारच्या घनचक्कर डोंगराच्या मधोमध असणा-या खिंडीत येतो. येथे सुरक्षेकरता  रेलिंग लावले आहेत.या खिंडीत आल्यानंतर पलीकडे आंबित गाव दिसते. आंबित गावातूनदेखील एक वाट निघून येथे याच खिंडीत येऊन मिळते. 


भैरवगडाच्या माथ्याअलीकडील पायऱ्या  आणि भग्न दरवाजा 
 
 

खिंडीच्या वरच्या बाजुला एक उध्वस्त टाक असुन उभा चढ असलेल्या काहीशा गोलाकार कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन उत्तराभिमुख असलेल्या उध्वस्त प्रवेशव्दारातुन आपला गडावर प्रवेश होतो. या दरवाजाशेजारील बुरुजाचा केवळ पाया शिल्लक असुन कड्यावर काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसुन येतात.
भैरवगडाचा नकाशा

 भैरवगडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण ३५०० फुट असुन आटोपशीर सपाट माथा असलेला हा गड पुर्व-पश्चिम साधारण ७ एकर परीसरात पसरलेला आहे. 

टाके समुह
 
गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला खडकात खोदलेली ४ जोडटाकी व त्याच्या पुढे एक कोरड टाक आहे. हि टाकी पाहुन पुढे न जाता मागे वळून डावीकडुन गड फिरण्यास सुरवात करावी. या बाजुस पाण्याचे एक जोडटाके असुन येथुन गडावर येणारा मार्ग नजरेस पडतो. 
 

कड्यावरुन दिसणारी आश्रमशाळा

 

 

भैरवगडावरील गुहासदृश जलकुंभ, चार टाक्यांचा समूह, 

 

पिण्याच्या पाण्याचं  टाक 

 

 
हे पाहुन पुढे निघाल्यावर डाव्या बाजुला मोठ खांब टाक आहे. या टाक्याची रचना अभ्यासनीय आहे. सध्या या टाक्याला जलकुंभ नाव दिलेले आहे. खडकात खोदलेल्या या बंदीस्त खांब टाक्यापर्यंत जाण्याची वाटही खडकात खोदलेली असुन या टाक्यासमोर खडकात एक गुहा खोदलेली आहे. या गुहेला वरील बाजूने छप्पर घालण्याची सोय केलेली असुन टाक्याच्या वर चारही बाजुस चर खोदुन त्यातुन पावसाचे पाणी गुहेत उतरवले आहे. या गुहेत भर उन्हातही थंडावा जाणवतो. या टाक्याच्या बाजुला एक रांजण खळगा कोरलेला असुन टाक्याच्या वरील बाजुस बरेच नैसर्गिक रांजणखळगे आहेत.
 
 या वाटेने भैरोबाच्या गुहेकडे जाताना उजव्या बाजुला खडकात खोदलेला ४ टाक्याचा समुह व त्याच्या वरील बाजुस ५ टाक्याचा समुह अशी ९ टाकी दिसतात.
 
 
 भैरोबाच्या गुहेच्या अलीकडे उजव्या बाजुला वाटेवर एक अलीकडच्या काळात कोरलेली साडेचार फुट उंच वीरगळ आहे.
 


वीरगळ 
 पुढे गुहेच्या वर डाव्या बाजूला चारही बाजू कोरलेली एक चौकोनी उंच वीरगळ असुन या विरगळी जवळ दोन गणपतीच्या व इतर काही झिजलेल्या मुर्ती शेंदुर फासुन ठेवलेल्या आहेत. 
 
पुढे खडकात खोदलेल्या पायऱ्या उतरुन कड्यातील भैरवाच्या गुहेत जाताना बाहेर अजुन एक वीरगळ दिसते. गुहा दोन दालनांची असुन एका दालनात भैरोबाची रंगवलेली पाच फुट उंच अश्वारुढ मुर्ती व काही कोरीवकाम केलेले शीळास्तंभ आहेत 
 
 
 
 
 
 
.खरं तर गडावर खंडोबा वसलाय. पण त्याला आणि पुढे ह्या गडाला "भैरव" गड कोणी केलं कुणास ठाऊक. कोणी इथे पदर पसरायला येतं तर कोणी त्या शक्तीला धन्यवाद द्यायला !!! त्याच्या शेजारच्या दालनात दहा जण राहु शकतील इतपत जागा आहे. या गुहेत एक चूल असुन काही भांडी सुद्धा ठेवली आहेत म्हणजे ट्रेकसाठी येणाऱ्या लोकांची जेवण बनवण्याची व राहण्याची सोय होऊ शकते. या भैरोबावर परिसरातील गावकर्यांची विलक्षण श्रध्दा आहे. भैरोबाला नवस बोलले जातात आणि काहीही करुन ते फेडले जातात. आपल्या मनातील नवस बोलायचा आणि जवळची दुर्वांची जुडी भैरवनाथांच्या डोक्यावर ठेवायची, जुडी खाली पडली तर नवस पुर्ण होणार. जर मुल होण्यासाठी नवस बोलला असेल तर नवस पुर्ण करण्यासाठी अश्वारुढ पुतळयाच्या दोन पायांच्या मधुन मुलाला किंवा मुलीला पलीकडे द्यायचे अशी  प्रथा आहे 
 
 












गुहेच्या कड्याला लोखंडी कठडे बसवले असुन त्यात एका बाजुला फाटक बसवले आहे. तेथुन खाली उतरण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन त्या काही प्रमाणात तुटल्या आहेत. या पायऱ्याच्या खालील बाजुस एक १०x १२ आकाराची एक गुहा आहे. येथुन शिरपुंजे गाव आणि आजुबाजूचा परीसर दिसतो. गुहेच्या समोर थोडयाशा उंचीचा गडमाथा आहे. 

गुहेसमोरून डाव्या बाजुने गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे चालायला सुरुवात केल्यावर कातळात कोरलेल एक मोठ टाक पाहायला मिळत. हे टाके पाहुन आपण आधी पाहिलेल्या ५ टाक्याच्या समूहाच्या वरील बाजूस निघावे.
येथे कातळात खोदलेली दोन खांबी मोठी गुहा आहे. या गुहेला दोन दरवाजे असुन एका मोठया दरवाजावर कमान कोरलेली आहे. 
 
 
 
 
 
या गुहेत पाणी साठल्याने ती एखाद्या टाक्यासारखी दिसते. गुहा पाहुन ५ मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो. इथे कातळात कोरलेली पाण्याची ३ टाकी असुन एका मोठया वाड्याचे अवशेष आहेत. भैरवगड पण उंची बाबत घनचक्कर पेक्षा अंदाजे  ३०० मिटर ने कमी असेल म्हणजे सिंहगड  एवढी उंची या गडाला आहे म्हणून या गडावर हवा नेहमी थंड राहते. 
 
कळसुबाई डोंगररांग  :  भैरवगड  (शिरपुंजे) वरून

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 भैरवगड माथ्यावरून दिसणारे शिरपुंजे गाव
 
गडमाथ्यावरुन आसमंतात नजर टाकल्यास कळसुबाई, हरीश्चंद्रगड, कलाडगड, कुंजरगड, नाणेघाट असा खूप मोठा परीसर नजरेस पडतो.एखादया जादूगाराने त्याच्या पोतडीतून अनपेक्षितपणे काहीतरी काढावं आणि बघणा-याचे डोळेच विस्फारले जावेत तसं दृश्य समोर येते. मुळा खो-यात हरिश्चंद्राच्या सभोवार फेर धरलेल्या किल्ल्यांनी,सुळक्यांनी आणि अफाट पसरलेल्या डोंगर जो काही नजारा पेश करतात त्याच्यासाठी शब्दच थिटे पडावेत !!! कलाडगड,न्हाप्ता,कलाडचा अंगठा,कोंबडा सुळका,कोथळ्याचा भैरवगड आणि असे कितीतरी !!! ह्या सगळ्यावर कडी करणारा सह्याद्रीचा अनभिषिक्त सम्राट…साक्षात हरिश्चंद्रगड मुळा खो-यातल्या ह्या सह्याद्रीच्या लोभस रूपाचं एखाद्या इतिहासपुरुषाप्रमाणे रक्षण करत होता !!! त्याचा बालेकिल्ला,तारामती शिखर,टोलारखिंड,वेताळधार,रोहिदास शिखर आणि पश्चिमेकडे अनादी अनंत काळापासून ठाण मांडून बसलेला कोकणकडा…हे दृश्य वर्णनाच्या पलीकडचंच !






 गडाच्या माथ्यावरुन आल्यावाटेने न जाता प्रवेशव्दाराच्या दिशेने उतरायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला दोन लांबलचक पाण्याची टाकी पाहायला मिळतात. ती पाहुन प्रवेशव्दाराजवळ आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीस एक तास लागतो. 
         गडावर जाणार्या कातळकोरीव पायर्या, कातळ कोरीव टाकी,भैरवनाथाची गुहा आणि परिसरातील हरिश्चंद्रगड, रतनगड हे प्राचीन दुर्ग बघता भैरवगड ही निश्चित समकालीन गड असणार. पण आपल्याला या गडाचे इतिहासात स्पष्ट उल्लेख मिळत नाहीत.एकतर भैरवगड नावाचे सहा गड असल्यामुळे नेमक्या कोणत्या भैरवगडाचा उल्लेख आहे, हे समजणे अवघड जाते. तरीही अंदाजे १६७० मध्ये मराठ्यांनी या परिसरातील किल्ले जिंकून घेतले.त्यात भैरवगड असावा, हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडीमार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी कोथळ्याचा भैरवगड आहे, तर राजूरमार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे.
     शिरपुंज्याचा भैरव एक सुंदर गड आहे. जवळ जवळ १५-१६ पाण्याची टाकी; गुहेतला संपूर्ण दगडात घोड्यासकट कोरलेला भैरव आणि गडमाथ्यावरून दिसणारा सुंदर परिसर; सगळंच खूप भारी. गडावरील अवशेष ब पाण्याची टाकी पहाता गड नांदत असताना गडावर मोठया प्रमाणात वस्ती असावी. गडावर पाण्याच्या २३ टाक्या असल्या तरी पिण्यायोग्य पाणी फक्त दोन टाक्यात आहे. भैरवगडाचं सौंदर्य हे एकदा तरी अनुभवायला हव असंच आहे.मनाच्या बेधुंद लहरींना शांत करण्याचं सामर्थ्य बहुधा या डोंगररांगांशिवाय दुसरं कुठलंही नसावं. हा सुंदर अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर सह्याद्रीचा हा ‘भैरव’ राग मात्र ऐकायला यावचं लागेल..
     हा भाग मुख्य शहरापासून आडबाजुला असल्यामुळे व या परिसरातील दळणवळणाचा आभाव आणि एकंदरीत गडांचे स्वरुप बघता एकेक गड वेगवेगळे बघण्यापेक्षा थोड्या जास्त दिवसाची सवड काढून ( दिवाळी किंवा ख्रिसमसची सुट्टी ) या परिसरातील सर्व दुर्ग एकदम बघणे सोयीचे पडेल.त्यासाठी खालील प्रमाणे नियोजन करता येईल.
१) मुंबईहुन दोन मार्गाने कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलाडगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात..
 मुंबई - कल्याण - मुरबाड - माळशेज घाट मार्गे  ओतुर गाठावे (अंतर १५९ किमी). ओतुर एसटी स्टॅंडच्या बाजूने एक रस्ता बामणवाडा - कोतुळ (अंतर ३० किमी) - विहिर (कुंजरगडाच्या पायथ्याचे गाव) मार्गे कोळथे (अंतर २५ किमी)  (भैरवगडाच्या पायथ्याचे गाव) - ७ किमीवर पाचनई त्यापुढे ५ किमीवर कलालगड आणि पुन्हा पाचनईत येऊन खडकी गाव गाठावे.(खडकीतून एक रस्ता आंबित मार्गे शिरपुंज्याला जातो. हा जवळचा रस्ता आहे पण खराब आहे.) खडकी पासुन १० किमी अंतरावर माणिकओझर गाव आहे. (इथुन ४ किमीवर राजुर आहे.) माणिक ओझर गावातुन डावीकडे आंबितला जाणार्‍या रस्त्याने १६ किमी गेल्यावर शिरपुंजे खुर्द गाव लागते. पोहोचतो. ( एकुण अंतर २६४ किमी ) . याशिवाय  मुंबई - इगतपुरी - घोटी - भंडारदरा - मार्गे राजुर ( अंतर १५५ किमी ) यामार्गेही जाता येते.
२) मुंबई - पुण्याहून शुक्रवारी रात्री निघुन स्वत:चे वाहान (या भागात एसटी आणि जीप्स (वडाप)ची फ़्रीक्वेन्सी चांगली नसल्यामुळे) असल्यास कुंजरगड (कोंबडगड), भैरवगड(कोळथे), कलाडगड, भैरवगड(शिरपुंजे) हे चार किल्ले दोन दिवसात पुढील प्रमाणे पाहाता येतात. शनिवारी सकाळी लवकर कुंजरगडाच्या पायथ्याला पोहोचुन कुंजरगड पाहुन घ्यावा. दुपारी कोथळे गावातील मंदिरात जेवण, आराम करुन भैरवगड पाहावा. कुंजरगड - भैरवगड (कोळथे) हे दोन किल्ले एका दिवसात पाहून पाचनईला मुक्कामाला जावे. पाचनईला जेवणाची आणि मुक्कामाची सोय होते. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी उन तापण्या अगोदर कलाडगड पाहावा. (कलालगड हा कठीण श्रेणीचा किल्ला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने रोप बरोबर ध्यावा.) दुपारी शिरपुंज्याचा भैरवगड पाहून परतीचा प्रवास करावा.
३) मुंबई - पुण्याहून शुक्रवारी रात्री निघुन कोळथेचा भैरवगड पाहावा. भैरवगडाला वळसा घालून टोलारखिंड मार्गे ५ ते ६ तासात हरिश्चंद्रगडावर जाता येते. रविवारी हरिश्चंद्रगड पाहून परतीचा प्रवास करावा
    तसेच शिरपुंजेच्या भैरवगडाला जोडून घनचक्कर आणि गवळदेव हि शिखरे आहेत.ज्यांना भैरवगडाबरोबरच घनचक्कर किंवा गवळदेव बघायचे असतील त्याच्या साठी खालील प्रमाणे नियोजन करता येईल. 

 
ghanchakargad
 घनचक्कर :-
घनचक्कर हे महाराष्ट्रातल्या सर्वांत उंच शिखरांमध्ये क्रमांक तीनचे शिखर आहे. याची समुद्रसपाटीपासूनची उंची १५०९ मीटर म्हणजेच ४ हजार ९४९ फूट आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. दुसऱ्या क्रमांकाचे शिखर गवळदेव हे घनचक्कर आणि कात्राबाईची खिंड यांच्यामध्ये आहे. हे माळशेज डोंगर रांगेत येते. याची उंची १५२२ मीटर (४९९२ फूट) आहे. फार दुर्गम भागात असल्यामुळे आणि ट्रेकच्या रस्त्यात पिण्याच्या पाण्याची काही सोया नसल्यामुळे गवळदेव (१५२२ मीटर्स ), घनचक्कर (१५३२ मीटर्स ) हि  शिखरे तशी  दुर्लक्षितच आहेत. 


 
   घनचक्करची वाट ही शिरपुंजेच्या भैरवगडाच्या खिंडीतून पुढे जाते. वाट थोडी जोखमीची आहे.मात्र खाली उतरून पुन्हा वळून वर येण्याऐवजी हि वाट घेतल्यास वेळ नि अंतर वाचते. पण, वाट नवखी, न वापरती आणि, साहजिकच, फार रुळलेली नसल्याने मस्त घसारा आहे. एक बारीकशी वाट पतवडी डोंगराच्या पोटातून आडवी पश्चिमेला जाते.फारशी वापरात नसल्याने वाट साफ करत पुढे निघायचे. हा अनुभवत घेतच एक वळसा मारुन पुढे घनचक्करच्या दिशेने जाणाऱ्या नियमित वाटेला आपण येऊन मिळातो.
भैरवगडाशेजारील  डोंगराच्या कडेकडेने घनचक्करकडे जाणारा वळसामार्ग 
सोपी वाट म्हणजे तुम्हाला घनचक्कर वरती जायचे असेल तर भैरवगड पूर्ण उतरून शिरपुंजे गावात परत यायला पाहिजे आणि शिरपुंजे वाडीतून घनचक्करचा एक उतरणारा दांड चढून पठारावर जायला लागते.घनचक्कर हा एक चमत्कारी डोंगर आहे कारण हा डोंगर एवढा पसरला आहे आणि त्याला इतके दांड आहेत कि तुम्हाला हा डोंगर कोठून कुठे पोहोचवेल याचा नेम नाही म्हणजे या डोंगरावरून तुम्ही भंडारदर्याला सुद्धा जाऊ शकता,हरिश्चंद्रगडला  सुद्धा जाऊ शकता,कुमशेत मार्गे कोकणात पण उतरू शकता,रतनगड-हरिश्चंद्रगड ट्रेक करणार्यांना तर हा घनचक्कर,मुडाचा डोंगर पार करावा लागतोच. त्यामुळेच या डोंगरावर सहसा कोणी डोंगरयात्री फिरकत सुद्धा नाही. वाटाड्या सोबत असेल तरच घनचक्कर डोंगर करायला इथून जावे अन्यथा जाऊ नये.वाटाड्या नसेल तर कोणताही डोंगर यात्री घनचक्कर वर सहज हरवून जाईल. फारसे ट्रेकिंग ग्रुप ह्या ट्रेकच्या वाट्याला जात नसल्यामुळे रस्ता वहिवाटीचा नाही. जरी गुगल नकाशावर दाखवत असला तरी एखादा वाटाड्या बरोबर घेणंच शहाणपणाचे होते.  एक पाऊल बसेल एवढीच जागा आहे. थोडा हलगर्जीपणा झाला, तर थेट दरीत. जवळपास शिरपुंजे गावापासून भैरवगड माथा आणि खिंडीपासून घनचक्करचा माथा आणि पुन्हा शिरपुंजे गावात पोहचण्यासाठी जवळपास पाच तास आणि आठ किलोमीटरचे पदभ्रमण करावे लागते. या डोंगराच्या ट्रेक ला यायचे असेल तर स्वतःचे वाहन आणू नये म्हणजे तुम्ही जेथून चढले आहात त्याच गावात उतरण्याची काळजी राहत नाही .घनचक्करच्या पठारावरून रतनगड ३ तासाच्या अंतरावर आहे पण हि फार बिकट वाट आहे   )
 
  भैरवगड खिंडीतील पायऱ्या 
 
भैरवगडाकडून घनचक्करकडे..मागे भैरवगड
 
घनचक्कर  वाटेवर लागणारी भव्य गुहा

       भैरवगडाच्या  खिंडीकडे उतरले कि पायरयावरून घनचक्कर माथ्याचे दूरदर्शन घडते. इवल्या पण लंब्याचौड्या आडव्या धुळीने माखलेल्या पायरया.. बेताने उतरून खिंडीत दाखल व्हायचे.आता घळ उतरून एक इथून तिथून ग्रील मारलेला लहानसा ट्राव्हर्स आहे.. तिथवर पोहचायचं मग.. इथे भैरोबाचा डोंगर आणि शेजारचा घनचक्कर खालच्या अंगाचा डोंगर साधारण ७० अंशामध्ये जोडला आहे.. इथेच ग्रील मधून एक वाट डावीकडे डोंगराच्या खालच्या अंगाने.. वळसे घेत जाते.. उजवीकडे दृष्टीभय देणारी दरी आणि डावीकडे डोंगरकडा २०-२५ फुट ठेवत.. ट्राव्हर्स सुरु होतो. डोंगराला वळसे मारीत तसाच ट्राव्हर्स पार करायचे कि आपण पहिल्या गुहेत पोहचतो.घसरड्या वाटेने रपेट  सुरु ठेवायची कि एका प्रशस्त गुहेच्या पुढ्यात येवून पोहचतो.
भैरवगड खिंडीतून खाली उतरताना डाव्या हाताने जाणाऱ्या वाटेवरील गुहा 


 
इथे गुहेच्या खालच्या अंगाने जाणारी पाण्याची वाट आहे.. सुकलेला धबधबा दिसतो. इंद्रदेवाच्या कोपामुळे गोकुळात अतिवृष्टी झाली. आलेल्या पुरात गायीवासरे वाहून जाऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि त्याखाली सर्व गावाला आसरा दिला हि पुराणकथा सर्वश्रुत आहे  पण विश्वास बसणार नाही, आम्ही असाच काहीसा चमत्कार इथे या डोंगरावर दिसतो. या डोंगरात नैसर्गिकरित्या एक अत्यंत खोल अशी कपार तयार झाली आहे. गावातील काही स्थानिकांनी या कपारीमध्ये गोठा बांधला आहे. इथे काही स्थानिक लोक वस्ती करुन राहतात. आत त्या गावकऱ्यांचा संपूर्ण संसार थाटला आहे. काटक्या आणि वेलींनी संपूर्ण कपार समोरून झाकून  टाकलेली दिसते त्यामुळे वारा पाऊस यापासून अगदी कडेकोट सुरक्षा होते. माणसेच काय, पण त्यांची पाळीव गाई,गुरे यांचाही निवारा आहे. हि कुटुंब या गुहेत फार पूर्वीपासून राहत असून दूध दुभत्याचा व्यवसाय करतात.

       गुहा मागे सोडत पुन्हा दोन डोंगरांना ६०-७० अंशाने जोडणाऱ्या घळईतून वर जाणारी एक ऐसपैस वाट आहे तिकडे निघायचे.. झाडीझुडुपातून जाणारी हि वाट बरीच रुंद आणि मळलेली आहे. ठिकठिकाणी गुरांनी सोडलेल्या शेणाची निशाणी या वाटेवर पाहायला मिळते.झाडीतून वाट चढून वर येताच एक लहानगे झाड आहे.. समोर दूर पाण्याची वाट दिसते. उजवीकडे एक डोंगराची कडा. इथे वाटेवर गारुबाईचे दगडी मंदिर आहे.मूर्ती भग्नावस्थेत आहे.आजूबाजूला अर्धवर्तुलाकृती गारगोटीचे थर रचले आहेत.या परिसरात गारगोटीचे दगड शोध घेतले तर मिळू शकतात. घनचक्करची चढाई सुरुच ठेवयाची. झाडापाशी आलो कि इकडे एक वाट उजव्या डोंगराच्या उजव्या अंगाने वर जाते. 
 
   कात्राबाई ते रतनगड दरम्यानच्या जंगलवाटेतील पांदीमार्ग
 
इथे बर्यापैकी जंगल आहे. हे पार करताच आपण घनचक्करच्या वरच्या बाजूला येतो.इथे डावीकडे तिरपी चाल आहे.डोंगर माथा डावीकडे ठेवत मळलेल्या पायवाटेने पुढे चालत राहायचे..
 
 
 
घनचक्कर माथ्याकडे वाटचाल

घनचक्कर माथ्याजवळून मागे पाहता भैरवगड

घनचक्कर माथ्यावरून आर्थर जलाशय..उजवीकडे धुक्यात पाबरगड
 
 या वाटेवर २-३ गुहा लागतात.आणि सुकलेले धबधबे.ह्या गुहा उजवीकडे आणि डोंगर माथा डावीकडे ठेवत चालत राहायचं आणि हा ३-४ किमीचा हा मार्ग पार करताच आपण घनचक्करच्या आडव्या पसरलेल्या शेवटच्या टेकडापाशी पोहचतो.समोर उजवीकडे घनचक्करचा सर्वोच्च माथा, डावीकडे एक डोंगराचे टोक आणि मध्ये सांधणारी डोंगर भिंत असा नजारा आहे. इथे इच्छा असेल तर एखाद्या झाडाखाली वनभोजनाचा आनद घ्यायचा आणि घनचक्करच्या सर्वोच्च माथ्याकडे वाटचाल सुरु करायची.इथून भंडारदरा जलाशयाचा काही भाग आता दिसू लागतो. घनचक्करचा माथा उजवीकडे ठेवत शिखराला गवसणी घालायची.घनचक्कर हे महाराष्ट्रातले तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आपण सर केले असते.घनचक्करचा पसारा तसा खूपच मोठा..शिखरावर पाहण्याजोगे जरी फार काही नसले तरी 'इथून' पाहण्याजोगे मात्र खूप काही आहे. येथून दिसणारं ते नगर-नाशिकचे गडवैभव नि ती निसर्गसंपत्ती तासनतास न्याहाळतच बसावे असे वाटते. घनचक्कर नावाप्रमाणेच आहे. वेगवेगळ्या गावातून अनेक वाटा येथे मिळतात. चुकण्याची संधी अधिक. भली मोठी खडी चढण जोमाने चढत माथ्यावर आलो. येथे पहाण्यासारखे अवशेष काहीच नाहीत. सह्याद्रीच अवलोकन मात्र करायचं. बाजूलाच पाबरगड डोकावत होता. गवळदेव शिखर खूलून दिसत होतं. खाली भंडारदरा. या टप्यावर थोडं विसावलो.

 कळसुबाई डोंगररांग  :  घनचक्कर  डोंगररांगेवरून..

 
इथला माहौल काही औरच असतो शिखरावरून उजवीकडे पाबरगड, समोर भंडारदरा जलाशय,  पलीकडे.. अलंग.. मदन कुलंग.. कळसुबाई डोंगररांग.. आजोबा मात्र.. गवळदेवाच्या मागे दडलेला आहे. पुढे कात्राबाईचा सुळका.जिकडे नजर फेकावी तिकडे दऱ्या-खोऱ्या.. उत्तुंग डोंगर. सह्याद्रीच्या डोंगरांचे पिवळ्या हिरव्या रंगाने नटलेले पदर, दृष्टीभय देणाऱ्या कातळधारा आणि तळपत्या उन्हात रुंजी घालणारा वारा. सह्याद्रीच्या या खांद्यावरून त्या खांद्यावर वाहणारा मुक्त वारा. एक जबरदस्त अनुभव पदरी जमा झालेला असतो. 
 गवळदेव :-
  घनचक्करची चढाई झाली तरी अजून अंगातील रग जिरली नसेल आणि सह्याद्रीच्या धारेतील तिसर्या क्रमांकाच्या शिखरावर पाउल ठेवायची इच्छा असेल तर मोहरा वळवायचा गवळदेवकडे !घनचक्कर माथ्यावरून गवळदेव माथा समांतर उंचीवर दिसत असतो.मात्र तिथे जाण्यासाठी पश्चिम उतारावर उतरणाऱ्या वाटेने खाली घळीत उतरायचे आहे.
 

(गवलदेव पर्वत)

(घनचक्कर उतरताना)
 

 
 
 
घनचक्करला जोडून असणाऱ्या टेकाडावरून पलीकडच्या डोंगरटोकाला जोडणारा मध्ये एक दांड आहे त्यावरून वाट आहे. आता हा उतार, ही घळ म्हणजे थोडक्यात घनचक्करची हद्दच आहे. पंधरा वीस मिनिटात घनचक्करचे पलीकडचे टोक गाठायचे. इथून पाहताना.. घनचक्करची एक सोंड. एखाद्या भिंतीसारखी खाली आडवी काटकोनात दिसते. उजवीकडे समोर  गवळदेवाचा डोंगर स्थानिक याला गवळीदेव असे म्हणतात.घनचक्कर आणि गवळीदेवाचा डोंगर यामध्ये एक खिंड आहे.ती उतरून थोडं वर चढायचं आणि मग डावीकडे.. गवळीदेवाच्या डोंगर पायथ्याने चालत.डावीकडचे नाक गाठायचं.इथून नाकाडावरून चाल करीत गवळीदेवाच्या डोंगरमाथ्यावर पोहोचायचं. 
घनचक्कर अन गवळदेव या दोहोंमधली ही  सीमादर्शक घळ
      येथून पुढे पलीकडे गवळदेवची हद्द सुरु होते. गवळदेवाकडे लक्ष ठेवत तीव्र उताराने झपाट्याने खाली उतरायला सुरवात करायची. समोर खोल आणि लांबवर पसरलेल्या दरीचा नजारा दिसत असतो. डावीकडे खोल दूरवर कुमशेत गाव दिसायला लागते. थोडे डावीकडे चालत असताना घनचक्कर आणि गवलदेव मध्ये एक खिंड लपलेली दिसते. अजून थोडे पुढे गेलो कि खाली उतरणारी, वाळलेल्या झुडपांमधून जाणारी वाट दिसते. त्या वाटेने, जवळपास अर्धा तास वेडीवाकडी वळणे घेत आपण खिंडीत येउन पोहचतो.इथे सावलीसाठी एकही झाड नाही
घनचक्कर माथ्यावरून गवळदेव माथा
घनचक्कर-गवळदेवला जोडणारी खिंडीकडे उतराई
घनचक्कर-गवळदेवला जोडणारी खिंड
भव्य घनचक्कर गवळदेव वाटेवरून
पहिल्या पठारावरून गवळदेवकडे वाटचाल
सोपा कातळटप्पा

घनचक्कर डाव्या हातास ठेवत आपले मार्गक्रमण होत असते. वर ताडाची झाडं दिसू लागतात. हि खूण गवळदेव जवळ आल्याची. एक बऱ्यापैकी चढ पार करत गवळदेव पायथ्याशी येतो. पठारावरुन  थोड़ उजव्या बाजूला खाली एक गुहा आहे. थकले भागले जीव गुहेत विसावले. या गुहेत पंधरा वीस जण आरामात मावतात. फक्त डोकं सांभाळाव लागतं एवढचं. डावीकडून मुडा डोंगराकडून आलेली वाट मिळते. छोटासा कातळटप्पा पार करून कसे बसे धापा टाकत सपाटीवर पोहोचलो तरी सर्वोच्च माथा अजूनही वर असतो. आता वाट बऱ्यापैकी सौम्य चढाची असून २० मिनिटांत गवळदेव या महाराष्ट्राच्या तिसऱ्या उंच शिखरावर पाऊल पडते.इथेही वर काहीही नाही.
 
 
 
 
गवळदेव माथा अन देवस्थान

फक्त एका छोट्याशा चौथऱ्यावर गवलदेवाची स्थापना केलेली दिसत होती. गवळदेवाची एक पांढऱ्या रंगाची पिंड आणि अनेक घंटा दिसतात. इथून अफाट नजारा दिसतो.

वाकडी सुळका व कुमशेत चा कोंबडा 
 
 
 
 
 
 

अजस्र बाहू पसरलेला एखाद्या योग्या प्रमाणे भासणारा आजा पर्वत,करंधा,कात्राबाई ,चिकटून असलेला अग्निबाण सुळका, रतनगड व दिमाखदार खुट्टा व भटक्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं त्रिकूट अलंग मदन कुलंग आणि आई कळसुबाई. खाली शांत स्तब्ध पहुडलेला भंडारदरा जलाशय. सारंच नजरेत भरणारं. 

गवळदेव शिखर सर केल्यावर आपल्यासमोर दोन पर्याय उरतात.एक, आल्यामार्गे घनचक्कर कडून शिरपुंजे गावात जायचे आणि तिथून पुढील मोहीम किंवा घरी परत. अजूनही हाईकची हौस संपली नसेल गवळदेववरुन मुडा शिखराकडे जाणे. तिथून कात्राबाईचे शिखर सर करुन रतनगडाचे रौद्र कड्यांचे एका वेगळ्याच कोनात दर्शन घेता येते. शिवाय रतनगड सर करुन साम्रदकडे उतरुन सांदण घळ बघता येईल. किंवा मुडा शिखर उतरुन कुमशेत गावी जाउन कलाडगड किंवा हरिश्चंद्रगडाला भेट देता येईल. 
कात्राबाई ट्रेक :-
   गवळदेवाकडे  मुड्याकडे कूच करायचे. मुड्याच्या डोंगरावरून कात्राबाई गाठायचे आहे. आजूबाजूला सह्यकडे, शिखरं,सुळके व एका बाजूला भंडारदरा जलाशय. त्यामुळे चालण्याचा थकवा जाणवत नाही. पायगाडी पुढे सरकत होती. 
मुडा शिखराकडून गवळदेवकडे जाणारी वाट

काही वेळातच वाकडी सुळका मान वर काढताना दिसतो. मागे कुमशेतचा कोंबडा व खाली पसरलेलं कुमशेत गाव असा नजारा दिसतो. समोरच कात्राबाई व खेटून असलेला अग्निबाण. आता चढाई आहे कात्राची. तब्बल पंचेचाळीस मिनिटांची थकवणारी. कात्रा पठाराचा आवाका बऱ्यापैकी मोठा आहे. 


(कुमशेतहुन दुसर्या दिवशी सुरवात)


(कुमशेतचा कोम्बडा)

(कात्राबाई टॉप चढाई)

(कात्राबाई खिंड)

येथून हा पाबरगड, तो हरिश्चंद्र,वाकडी सुळका,कुमशेतचा कोंबडा ,करंधा,आजोबा अशी पुन्हा उजळणी करायची. येथून रतनगड व खुट्टा अगदीच जवळ दिसतात. मध्ये फक्त भयाण दरी. एक दोन उड्यात पोचता येईल का?(मनातला विचार फ़क्त )

कात्राबाई : उघड्यावरचे मंदिर : बंदीस्त मंदिरासाठी श्रद्धेनुसार परवानगी नाही.


(कात्राबाई मन्दिर)
   कात्रा बघून निघायचे रतनगडकडे. कात्रा उतरुन कात्राच्या जंगलातून रतनच्या दिशेने निघायचे. सुरूवातीस दगडधोंडे खाच खळग्यांची वाट. दिशादर्शक बाणही आहेत फक्त ते रतन ते कात्रा खिंड असे आहेत. आपला प्रवास मात्र उलट आहे. घनदाट झाडी,मोठाले वृक्ष यामुळे थकवा व उकाडा जाणवत नाही. येथे बिबटे मोठ्या प्रमाणात आढळतात. कात्राच्या जंगलात एकाठिकाणी पाणी साठा आहे. मजल दरमजल करत वाट कापत गेलो कि रतनगडाचा खुट्टा नजरेत येऊ लागतो. रतनच्या चौफुलीकडे पोहोचलो कि सज्ज व्हायचे रतनगडाच्या चढाईस. शिड्या पार करत माथ्यावर पोचलो कि जिथून आलो त्या कात्राचा भव्य अवतार नजरेत भरून घ्यायचा.

काही नोंदी:
१)पल्ला खुप मोठा असल्याने व् मध्ये  गावांशी संपर्क नसल्याने मानसिक व शारीरिक तयारी असावी.
२)ऑक्टोबर ते जानेवारी सर्वोत्तम. शक्यतो पावसात टाळावा. धुक्यामुळे चुकण्याचा संभव.
३)जंगलवाट असल्याने सोबत वाटाड्या असणं सोयीस्कर.
३)मधे फार ठिकाणी पाणी नसल्याने ४-५ ली पाणीसाठा ठेवावा.
४)जेवणाची सोय गवळदेव पायथ्याला बारामते कुटुंबाकडे होउ शकते. पण तेही पाणीसाठा संपल्यावर गाई घेऊन कोकणात उतरतात.
सुरवात : शिरपुंजे शेवट : कुमशेत 
मार्ग : शिरपुंजे-भैरवगड-पतवडी डोंगर-घनचक्कर शिखर-गवळदेव शिखर-मुडा-कात्राबाई खिंड-कुमशेत 
एकूण चढाई उतराई: १४५० मीटर्स 
श्रेणी :मध्यम
एकूण डोंगरयात्रा:२२.३ कि.मी 

चढाई उतराईतील टप्पे:
शिरपुंजे(९३५ मीटर्स)-भैरवगड माथा(१२५० मीटर्स)-घनचक्कर(१५१० मीटर्स)-गवळदेव खिंड(१२६० मीटर्स)-गवळदेव माथा(१५२५ मीटर्स)-कात्राबाई खिंड(११७० मीटर्स)-कुमशेत(८५० मीटर्स)
 संदर्भ :-
१) अहमदनगर जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४)  शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
५) www.trekshitiz.com    हि वेबसाईट
६)  www.durgabharari.in   हि वेबसाईट
७)  सुशील दुधाणे, https://www.garvanemarathi.com/ https://samant fort.blogspot.com, https://treklikevaibhavsachin.blogspot.com, http://pkothavade.blogspot.com, http://www.onkaroak.com,http://shirpunje.blogspot.com, http://vatadya.blogspot.com  हे ब्लॉग


      




   


         
 
 









Seeta Gumpha:








View from top (Durg-Dhakoba, Jivdhan and Nanacha Angtha forts in Junnar region clearly visible):



Group photo:



Water Cisterns from top
















खरंतर आमचं नशीब जोरावर होतं आज, आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. नुकताच पावसाळा संपलेला, त्यात प्रवरा नदीच्या या पात्रात, भंडारधरा धरणाचं पाणी महिन्यात दोनचं शनिवार/रविवार सोडतात आणि तो रविवार आज होता. खच्चून पाणि होत फॉलला. हे पाणि पुढे संगमनेर मधून गोदावरीत जाऊन मिळतं. या परिसरात आजपर्यंत अनेक टेक केले, कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्र, कालाडगड.... पण हा अप्रतिम देखावा पाहायचा योग आजच आला होता. खरतर, मला हा स्पॉटचं माहीत नव्हता, भैरवागडाच्या परिसराचा अभ्यास करताना सापडला आणि मग लिस्ट मध्ये ऍड केला!

परत येता येता, भैरवगडाच्या गुहेच्या दाराशी बसलेली मुलं आठवत होती. सोमवार ते शनिवार शाळेत विज्ञान शिकणारी मुलं आज रविवारी देवाला कौल लावणारे पालक पाहत होती. शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या  अनुभवांची शिकवण मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून ही मुलं मोठी होतीलं. जरी कोणी डॉक्टर/इंजिनिअर झाला तरी जीवनातल्या एकाद्या पडत्या प्रसंगात भैरोबाच्या डोक्यावर कडूलिंबाचा पाला ठेवून कौल लावतील!
- वैभव आणि सचिन.








भैरवनाथांचा अश्वारुढ पुतळा


Steps ,Bhairavgad (Shirpunje)
  

Veergal at Bhairavgad (Shirpunje)

सहसा भेट न दिले जाणारे आडबाजूचे किल्ले पाहायला जातांना फ़ार काही पाहायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. GPS Mapping करायच, नकाशे बनवायचे किल्ल्यावरील अवशेषांची  नोंद करायची , माहिती जमा करायची या उद्देशाने गेलेल्या आम्हाला या गडांनी समृध्द करुन टाकल.जाण्यासाठी:- 




शिरपुंजे तून भैरवगड 
अकोले तालुक्यातल्ये गड किल्ले परिसर केव्हाही मनास भावतात. येथील वाटा पायदळी तुडवण्यास पाय नेहमीच उत्सुक असतात. अशीच संधी मिळाली महादेवमुळे. भैरवगड ते रतनगड. ऑफबीट असा.  महाराष्ट्रात पाच भैरवगड आहेत. त्यातला हा शिरपुंजेचा.

शुक्रवारी रात्री खचाखच भरलेल्या कसारा लोकलमध्ये बँग सावरत चढलो. ट्रेक सुरू झाल्याची जाणीव झाली. नशीब चांगलं थोड्याच वेळात बसायला जागा मिळाली आसनगाव पार केल्यानंतर तर पूर्ण सीट मालकीची झाली. मग काय दिलं ताणून कसारा येईपर्यंत. पुढचा प्रवास जीपचा शिरपुंजे पर्यंत. या रस्त्यांवर जीपा फॉर्म्युला वन सारख्या धावतात. रात्री मारुतीरायाच्या मंदिरात मुक्काम ठोकला. थंडी जाणवत होती. सकाळी लवकर उठत भैरवगडाकडे कूच केलं. वरून भैरवगड खुणावत होता. वर भैरोबा हे गावकऱ्यांचे देवस्थान आहे. त्यामुळे हा राजमार्ग आहे. विजेचे खांब असलेला रस्ता धरून चालत रहायचं. वेडीवाकडी वळणं घेत वाट धावत राहते. मध्ये कातळात खोदलेल्या पायऱ्या मार्ग सुकर करतात. काही वेळातच खिंडीत पोहोचलो. येथे सुरक्षेकरता  रेलिंग लावले आहेत. डाव्या बाजूची खडी चढण थेट गडावर घेऊन जाते. येथे शेवटच्या टप्प्यात ऊंच पायऱ्या आहेत. वर गेल्यावर डाव्या हाताला थंडगार पाण्यानं  तृष्णा भागवणारं कातळात खोदलेलं टाकं लागत. लगेचच पुढे उजव्या हातास टाकेसमुह आहे. भैरोबाच दर्शन घेण्यास पुढे निघावं. वाटेत सुंदर कोरलेल्या वीरगळी आहेत. थोडंस खाली उतरत खडकात खोदलेल्या गुहेत भैरोबाची शेंदूर फासलेली सुबक मूर्ती आढळते. या गुहेला चिकटून असलेल्या गुहेत सहा सात माणसं आरामात राहू शकतात. आता वेळ होती सभोवताल पहाण्याची. भला मोठा पसरलेला हरिश्चंद्रगड, रोहिदास, कलाडगड , नाफ्त्याचे डोंगर. पायऱ्या उतरून खिंडीत आलो. पहिला सोपा टप्पा पार झाला होता.





गुहेतील भैरोबा 

Soon, peaks started wearing the golden look and all of us were delighted with the marvellous sights.

Ganesh, Ramnath's nephew who accompanied us as our second guide:


Tushar Dada posing for the photo:


Sandeepak Phadke in buoyant mood:


Chinmay Kirtane and Ajay Deshpande clambering the steep slope:



After climbing a hill, we had to traverse a mountain. We spotted many honey bees' nests and with total silence, we negotiated the traverse.

On the traverse




Sun came up above the mountains as we were negotiating the traverse. Turning right after the traverse, we again started climbing another hill.



Few monkeys were basking in the sun and their silhouettes with golden border looked stunning and I lingered on the same spot soaking in the great sight and clicking few good frames.


Our guide Ramnath waiting for us to join:


Beautiful mountains seen during the hike:


Bhandardara dam with the backdrop of mighty mountains:


Tushar Dada basking in the golden light:


Sandeepak wrapped in his own thoughts:


Ghanchakkar- the triangle shaped mountain welcoming us:


Spectacular sights of the glorious Sahyadri mountains; these sights make us venture into Sahyadri mountains again and again.


We hadn't breakfasted yet. As the sun was warming up, Ajay urged us to stop as he was worried about his packed sandwiches getting foul in heat. As we had gained a lot of height and covered a lot of distance in initial two hours, we decided to take a break for breakfast. We feasted on the sandwiches brought by Ajay.

After climbing another hill, we reached a plateau from which Ghanchakkar was at a striking distance.


Ghanchakkar looked like a tiny hill from this plateau.



We took a trail leading us to col between two hills. As we reached to this col, vista of Ratangad, Khutta Pinnacle, Katrabai, Gavaldev mountain and many other unknown mountains made us speechless.



View of Khutta Pinnacle and Ratangad:


After doing some photography, we climbed remaining slope of Ghanchakkar and reached to the top. Time: 9.15 AM.

Ghanchakkar top offered us mesmerizing views spanning 360 degrees. We spent a great time in identifying many forts and mountains.


Celebration time for standing on third highest peak of Maharashtra:



Ramnath and Ganesh resting on top:



We descended and decided to explore hill to our right. We got great views of Gavaldev Mountain from it. With plan of visiting it sometime in future, we started descending.

Gavaldev Mountain:


Sandeepak posing for the shutterbug:



As we were descending towards Gardevi Point, I fell down on the scree. I tried to check my fall with the help of my palms but in the process, my palm got cut by the sharp stones and blood started oozing out. All rushed and helped me sanitize the wound and after a while, we resumed our hike. I now started descending with much more caution.

Gardevi Point:



Now, our next aim was to hike to Bhairavgad over the mountain ridges. We started traversing the mountain.


Traverse was narrow with a lot of scree. We experienced some anxious moments along this traverse. We came across two caves like structure during this long traverse.

Thrilling traverse:




Dog (Bunty) accompanying us throughout the trek:


On the traverse, we had to find our way through the bushes indicating that this trail was not frequented by trekkers or locals.

Finally, the ordeal of the long horizontal traverse got over and we joined rock cut steps of Bhairavgad. Time: 12 PM




Throng of pilgrims were on their way to take blessings of Lord Bhairavnath. We were surprised to see all these pilgrims bare footed. We did not dare to remove our shoes and started ascending rock cut steps of Bhairavgad.

Soon, we were on top of Bhairavgad. We rested near the two water cisterns. Splashing water on the faces and wetting the hair with the cold water completely rejuvenated us. I was carrying lemon, Jaljira powder and sugar and we prepared two bottles of Jaljira and lemon Juice. It replenished all the lost minerals and we felt alive again.

We entered the temple after a while and perched in front of Lord Bhairavnath's idol. Monkeys seemed to be trouble maker and all the pilgrims advised us not to keep anything outside. We somehow managed to fit our backpacks, camera bags inside already cramped temple.

Lord Bhairavnath:



After sitting for 10 minutes, we decided to come out to explore remaining parts of fort.

Exploring the fort where we came across many water cisterns and idols:


It was past noon when we finished the exploration. We then decided to descend. Descent was quite tedious in the scorching heat. After one to two short breaks, we reached to the base.



At the base:


There was further walk down the tar road to reach to our car.

Looking back, Bhairavgad was looking rugged and hostile in the afternoon heat.


We soon reached to the temple, got refreshed, changed our clothes and after paying fees to our guide, left towards Pune. It was 4PM when we stopped for lunch. Famished, we feasted on Punjabi Food and resumed our journey towards Pune. It was again a nightmare in the evening traffic and finally we reached around 9.30PM in Pune culminating the tiresome but satisfying day of hiking.

Ghanchakkar, the third highest peak in Maharashtra offers great panoramic views from the top. Very few places in Western Ghats offer such sweeping views of Sahyadri Mountains. Bhandardara dam in the foreground provides added beauty to this magnificent landscape. A must see for hard-core trekkers! Bhairavgad (Shirpunje) also doesn't pale in comparison with Ghanchakkar and provides some stunning views from the top. 

  • Special thanks to Onkar Oak to suggest this trek when I had run out of the options of deciding the trek location.
  • Special thanks to Ishwar Gaikwad Uncle for providing information for 

Thank you for reading the blog!

Do visit my home page to easily navigate to my other blogs.

Happy hiking!
 शिरपुंजे उर्फ आंबीतचा भैरवगड,कोथळ्याचा भैरोबा दुर्ग आणि हरिश्चंद्रगडाचा काहीसा उपेक्षित शेजारी असणारा कलाडगड ह्यांचे दर्शन आणि सोबतीला भक्कम ट्रेकर्सची साथ हाच ह्या ट्रेकचा "युएसपी" होता. शनिवार उजाडताना शिरपुंज्यात पोहोचलो तेव्हा पूर्वेचं दार नुकतच उघडून लालबुंद झालेल्या लोहगोलाने काही सोनेरी कवडसे अभिषेक म्हणून भैरोबाच्या अनगड राउळावरही टाकले आणि ते दृश्य बघताना आम्हीही सुखावलो !!!



तीन कातळकड्यांचा मिळून बनलेल्या भैरवगडाच्या मधल्या आणि उजवीकडच्या कातळकड्याच्या मधोमध एका गुहेत भैरोबा वसलाय !!! शिरपुंज्यातूनही त्याची ती गुहा,बाहेरची रेलिंग्स आणि गुहेची ओळख पटवून देणारे झेंडे स्पष्ट दिसत होते.  



गावातून शेतं तुडवत दहा मिनिटांच्या आत ह्या स्वागतकमानीपाशी पोहोचता येतं. हा भैरोबा म्हणजे पंचक्रोशीचं श्रद्धास्थान !! कमानीवरच्या फोटोत दिसत असल्याप्रमाणे खरं तर गडावर खंडोबा वसलाय. पण त्याला आणि पुढे ह्या गडाला "भैरव" गड कोणी केलं कुणास ठाऊक. कोणी इथे पदर पसरायला येतं तर कोणी त्या शक्तीला धन्यवाद द्यायला !!! आम्ही मात्र भैरवगडावरून दिसणा-या सह्याद्रीच्या दुर्गमतेपुढे नतमस्तक व्हायला आलो होतो. 


शिरपुंज्यातून गडावर जाण्यासाठी प्रशस्त वाट आहे. वाट कसली…राजमार्गच !!! भैरोबाच्या भक्तांनी सह्याद्रीच्या भक्तांसाठी तयार केलेला !! गडाचा जवळपास ऐंशी टक्के भाग चढून झाला की ग्रामस्थांनी दरीच्या कडेला संरक्षक रेलिंग्स लावली आहेत !! म्हणजे गडमाथा जवळ आला तर…


गडाच्या मार्गावर कुणी अनामिक कारागिराने कातळात खोदलेल्या पाय-या आपला मार्ग सुकर करतात. 


शेवटच्या नाळेतली खडी चढण सकाळच्या थंडाव्यामुळे आणि गडाच्या कड्यांनी दिलेल्या सावलीमुळे सुसह्य झाली.  


शिरपुंज्यातून निघाल्यापासून तासाभरात भैरवगड आणि त्याच्या शेजारच्या डोंगराच्या खिंडीत पोहोचलो आणि एखादया जादूगाराने त्याच्या पोतडीतून अनपेक्षितपणे काहीतरी काढावं आणि बघणा-याचे डोळेच विस्फारले जावेत तसं दृश्य समोर आलं. मुळा खो-यात हरिश्चंद्राच्या सभोवार फेर धरलेल्या किल्ल्यांनी,सुळक्यांनी आणि अफाट पसरलेल्या डोंगरांनी जो काही नजारा पेश केला त्याच्यासाठी शब्दच थिटे पडावेत !!! कलाडगड,न्हाप्ता,कलाडचा अंगठा,कोंबडा सुळका,कोथळ्याचा भैरवगड आणि असे कितीतरी !!! ह्या सगळ्यावर कडी करणारा सह्याद्रीचा अनभिषिक्त सम्राट…साक्षात हरिश्चंद्रगड मुळा खो-यातल्या ह्या सह्याद्रीच्या लोभस रूपाचं एखाद्या इतिहासपुरुषाप्रमाणे रक्षण करत होता !!! त्याचा बालेकिल्ला,तारामती शिखर,टोलारखिंड,वेताळधार,रोहिदास शिखर आणि पश्चिमेकडे अनादी अनंत काळापासून ठाण मांडून बसलेला कोकणकडा…हे दृश्य वर्णनाच्या पलीकडचंच !! घडाळ्याच्या काट्यांनी डोळ्यांच्या भिरभिरण्यावर हुकुमत गाजवत पावलं उचलायला भाग पाडलं. भैरवगडच्या अगदी शेवटच्या टप्प्यात खणखणीत अशा पाय-या असून त्या चढून आलो की गडाचा पूर्णपणे उध्वस्त झालेला दरवाजा आहे. त्याच्या कमानीच्या बुरुजांनीच काय ते गडाचं गडपण राखलंय. भैरवगडच्या विस्तीर्ण पठारावर आमचं पाऊल पडल्याक्षणीच त्याचं दुर्गमत्व नजरेत भरलं. दरवाजातून थोडीशी उजवीकडे गेलेली वाट भैरोबाच्या गुहेकडे घेऊन जाते. शिरपुंज्याच्या ह्या अनवट दुर्गरत्नाने आपल्या माथ्यावर पाण्याची असंख्य टाकी धारण करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पाण्याची अनेक जोडटाकी भैरवगडावर आहेत, ह्यातल्या काही टाक्यांचं पाणी चवीला ठिकठाक तर काही अगदीच पचनसंस्थेशी प्रतारणा करणारं.











शिरपुंजे गावाच्या माथ्यावर असलेल्या कड्याच्या एका नैसर्गिक गुहेत भैरोबाचं ठाणं आहे.  दोन दालनांच्या गुहेतील एका दालनात खंडोबाची कमालीची देखणी मूर्ती तर त्याच्या शेजारच्या दालनात चार - पाच लोक झोपू शकतील एवढी जागा !!



गुहेच्या बाहेरच्या बाजूला जवळपास अर्धा पुरुष उंचीच्या वीरगळी आहेत. काहींवर देव - देवतांची चित्र कोरलेली आहेत तर काहींवर काही प्रसंग कोरलेले आहेत. कलाकुसर मात्र अग्गदी नजरेत भरण्यासारखी !!!







गडाच्या ह्या भागात पाण्याच्या टाक्यांशिवाय बघण्यासारखं काSSSही नाही. गुहेपासून समोर थोडक्या उंचीचा गडमाथा आहे. ह्या माथ्याकडे जातानाही पाण्याची काही टाकी आहेत पण ह्यातील एक खांबटाकं म्हणजे अमृतकुंभच !!! स्फटिकासमान नितळ पाणी आणि चव म्हणजे स्वर्गीय !!! भैरवाच्या दर्शनासाठी रणरणत्या उन्हात गड चढून आलेल्या भक्तांची तहान निवारण्याचं पूर्ण सामर्थ्य ह्या जळात सामावलंय !!

अकराच्या ठोक्याला शिरपुंजे गावात परतलो तेव्हा ऊन भाजून काढू लागलं होतं.
 
 
 http://sskothawade.blogspot.com/2021/02/blog-post_16.html
 

 भैरवगड ते रतनगड

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

till date (कल किसने देखा है?), easily the most beautiful trek in Sahyadris and invariably, the best post from this blog.. भैरवगड ते रतनगड

आपणच cylinder ️🛢️, शेगडी 🔥, भांडे 🗡️ 🍽️ ️, किराणा 🌾, tent ⛺ वगैरे घेऊन स्वावलंबी trek करणाऱ्या विशाल बरोबरच काय तर सह्याद्रीतच camping करायचा हा पहिलाच प्रसंग.. ह्या आधी, साधारण ३ आठवड्यापूर्वी गणतंत्र दिवसाच्या 🇮🇳 निमित्ताने प्रचंडगडावर प्रचंड ध्वजाचं ध्वजारोहण बघण्याकरता भुतोंडे खिंडीतून, via बुधला माची, जो तोरणा night trek 🌃 केला होता, तो मागच्या वर्षी अस्वलखिंड cancel झाल्यामुळे SG बरोबरचा ☝️️ पहिलाच..

डिसेंबर end २०१९ ला काही कारणास्तव योग नव्हता आला आणि ह्या वेळेस लग्नाच्या वाढदिवसाला ❣️ ठेवल्याने परत हुकतो, असंच काही वाटत असता राहुलचा message आला, "मी जातो आहे" 🙋‍♂️.. खूप धाडस करून better-half ला विचारलं.. "कोशिश करने वालो की कभी हार नही होती" किंवा एका जाहिरातीत म्हंटल्याप्रमाणे "पुछने मे क्या जाता है?" ते हेच.. आणि तेच स्वप्नील खोत पण येतो आहे कळल्यावर तर there was no looking back 🤗..

१३ फेब्रुवारी २०२१

बरं, भैरवगडला निघालो आणि गाडी 🚍 वेळेवर पोहोचली असेल, असं कधी होत नसतं.. मागच्या रविवारी मोरोशीला जातांना tyre फाटलं (read post here), आणि आज शिरपुंजेला जातांना clutch went loose..

वेळ होती पहाटेचे ३:३० आणि जागा होती सन्नाटा - नाशिक-पुणे highway 🛣️️, संगमनेरच्या अलीकडे २३ कि.मी... gear ⚙️ सहजा-सहजी पडत नव्हता आणि म्हणून गाडी पुढे सरकायलाच तयार नव्हती.. फोन 📱 करून, काय करायला पाहिजे? आणि गाडी जर नाहीच हलली तर ट्रेकचं काय करायचं? अश्या काही प्रश्नांचे ❓उत्तरं सापडायचा कार्यक्रम सुरु झाला.. सल्ल्याप्रमाणे कसा-बसा पहिला आणि एखाद कि.मी. नंतर दुसरा gear टाकून गाडी १२ कि.मी. पुढे हिवरगाव पावसा toll plaza पर्यंत आली.. एका गॅरेज 🔧 वाल्याच्या टपरीवर त्याचा नंबर होता (असतोच).. phone केला तर येतो म्हंटला, परत केला तर (त्याच्या) गाडीत petrol नाही.. plaza ओलांडून दुसऱ्याला phone.. 'gangs of wasseypur' सारखा हा मात्र आला.. 'नक्की काय झालंय?' ह्याचा तपास घेत कळलं की (आमच्या) गाडीत oil 💧 नाही आणि पहाटे सोय होणं कठीण.. तरी आम्ही hopes नव्हते सोडले.. plan B म्हणून २ bolero गाड्यांची arrangement झाली होती, आणि त्या निघणारच, तेवढ्यात आमची ही गाडी clutch-ready झाली.. स्थगित झाली होती ती प्रक्रिया परत सुरु झाली.. नंतर मात्र 😴 शिरपुंजेला पोहोचुनच ८:३० वाजता जाग आली..

मागच्या वेळेस गावात दूध 🍼 भेटलं नव्हतं, म्हणून दूध पावडर घेऊन आलेल्या वैभवची बॅग 🎒 ८ जणांनी पालथी घातली.. शेवटी यमला 😈 ती सापडली, (अर्थातच, यमला नसती सापडली तर ती परतल्यावर वैभवला पण नसतीच सापडली 😉).. तोपर्यंत "उपम्यात कोण मनुका टाकतं?" आणि "अजून नाही टाकायच्या, आपल्याला सगळ्यांचं नशीब 🍀 test करायचंय" अशी काही चर्चा करत १० 🕙 पर्यंत चहा-नाश्ता झाला.. आधी नाश्ता, नंतर चहा 🍵 असतो ना, मग नाश्ता-चहा म्हणायला पाहिजे ना?.. असो, "मला batting नको" हे आज आम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच ऐकायला भेटलं (बहुत कुछ life मे पेहली बार होता है, हे माझ्या बाबतीत तरी ह्या trek मध्ये भरपूर वेळेस झालं).. गावातले लहान-सान पोरं cricket 🏏 खेळत होते, वाटलं थोडं आपणही relive-the-childhood करायला काय हरकत आहे? यमचा लाल डोळा, ही आजच्या cricketची आठवण..

cricket - country's religion


first mountain, first view

सगळं आवरत (गाडीत ठेवत), फक्त पाणी 🍶, घरून आणलेला दुपारचा डब्बा 🍱 आणि रात्री उशीर होणार म्हणून torch घेत आम्ही १०:३० 🕥 ला scheduled range मधला पहिला गड ⛰️ चढायला सुरुवात केली.. कुठेही सपाटी नसलेला आजवर ट्रेक केलेल्या गडांमध्ये हा बहुतेक पहिलाच गड असावा.. संपूर्णतः पायऱ्या (ढासळलेल्या धरून) असलेल्या ह्या गडावर पोहोचलो की फक्त पाण्याचे टाके दिसतात.. काही कोरडे तर काही भरलेले, काही open-to-sky तर काही covered.. थंड आणि गोड mineral water पिण्याचा हा आयुष्यातला पहिलाच आनंद.. ढाक-बहिरीला बघितले (read post here), तसेच ह्या गडावरच्या भैरवाच्या मंदिरात सुद्धा public use साठी भांडे आहेत.. स्वयंपाकासाठी वापरायचे आणि धुन परत ठेऊन द्यायचे.. चोरी होत नसते..

शिलालेख (अवशेष)

एखाद्या / कुठल्याही गडाच्या top वरून चारही दिशांना दिसणाऱ्या प्रत्येक गडाचं नाव आपण सांगू शकता का? तर प्रत्येकाचं नाव तरी आहे का? हा पहिला प्रश्न पडतो.. स्वप्नील साठी हा "बाएं हाथ का खेल" आहे.. येव्हढंच नाही तर प्रत्येकाचा इतिहास आणि भौगोलिक, सांस्कृतिक महत्व सुद्धा.. सिंह 🦁 ठीक आहे पण अस्वल 🐻, गाढव 🐴 आणि कोंबडा 🐓 नावाने पण डोंगरं / गड असू शकता, हे फक्त त्याच्याबरोबर ट्रेक केल्यावरच कळू शकतं.. स्मृतीशिल्प आणि खालून वर वाचली जाणारी वीरघळ, यांची तो सांगत असलेली, सविस्तर माहिती ऐकून झाल्यावर आम्ही गड उतरायला सुरवात केली..



"बासरी सारखा आवाज कुठून येतो आहे?" तर हा होता trekking poleला height adjust करायला असलेल्या holes 🕳️️ चा जादू.. जशी बासरी वाजवायला आपण हवा फुंकतो, तशीच ह्या holes मधून जाणाऱ्या वाऱ्यामुळे बासरी वाजल्यागत भास होत होता.. त्या holesला specifically काही म्हणत असतील, तर जरूर कळवा..

थोडंसं उतरून करायचा होता traverse, आणि तो काही कमी नव्हता.. वाटेत २ गुहा लागल्या, जिथे लोक actually राहतात (आमच्या सारखे trekkingला आलेले नाही, तर, स्थायिक / कायमस्वरूपी).. इथे खवा 🍚 बनवून खाली राजूर गावात विकता, जिथले कंदी पेढे 🍮 world-famous आहेत.. शेवटच्या झाडाखालच्या 🌳 सावलीत घेतलेल्या विश्रांतीला tata bye-bye करत आम्ही उजाड plateau वरून गारगोटी बघत, आता कुठे दिसू लागणाऱ्या 'महाराष्ट्राच्या चौथ्या उच्च शिखर' घनचक्करच्या दिशेने चालत होतो.. ह्या डोंगरावर बघायला तसं काहीच नाही, पण इथून दिसणाऱ्या viewला आजच्या दिवशी मात्र तोड नव्हता.. "सुख काय असतं?" म्हणत वेळ होती DSLR 📸 ची..

स्थायिक

गारगोटी on घनचक्कर

जिथून आलो तो भैरवगड आणि जिथे जाणार आहोत, ते गवळदेव, कात्राबाई, रतनगड सोबत AMK, कळसुबाई, हरिश्चंद्रगड आणि wilson dam (भंडारदारा) 🏝️️ चे अतिसुंदर दृश्य सोबतीला घेत आम्ही दुपारच्या ३ वाजता तिथे ऊन्हात पण थंड वाऱ्यात जेवण करायचा 🥙 मौका साधला.. विश्वासला lens cap हरवली, हीच समजूत घेऊन तिथून प्रस्थान करावं लागलं (संध्याकाळी सापडली म्हणा)..

wilson dam (भंडारदारा) आणि बरंच काही

गवळदेव from घनचक्कर

भैरवगड ते घनचक्कर तसा (relatively) जास्त चढ नव्हता, पण समोर दिसणाऱ्या 'महाराष्ट्राच्या तिसरा उच्च शिखर' गवळदेवला जायला आता k2sच्या शेवटच्या डोंगरांहुन (read post here) कडी मेहनत करावी लागणार होती.. खाली उतरून जवळ-जवळ ६०% base traverse करायचा होता.. अंधार व्हायच्या आत कमीत-कमी गवळदेवचा scree असलेला patch तरी उतरून झाला पाहिजे, हे target सकाळीच set केलं होतं.. त्या हिशोबानेच, आम्ही गवळदेवचा rockpatch 🧗 चढून, माऊलीने आणलेल्या कोकमचा 🍹 आनंद घेत, ह्या २ दिवसाच्या range trek मधल्या सर्वोच्च बिंदूहुन आजचा मावळता सूर्य 🌇 बघितला..

घनचक्कर from गवळदेव

गवळदेव

अंधार व्हायच्याआधी आम्ही फक्त गवळदेवच उतरलो नव्हतो तर समोर दिसणारा पर्वतीहुन छोटा मुडा सुद्धा चढून, दुसऱ्याबाजूने उतरलो होतो.. उर्वरित कार्यकर्ते स्वेच्छेने जसं आणि जितकं जमत असेल, तसं आणि तितकं trek करत उशीर होणार नाही, ह्याची काळजी घेत होते.. तन्मय आणि संजयला मात्र निराश करण्यात आलं, गवळदेव पूर्ण चढले असते तर उतरायला 🌑 अंधाराबरोबर rockpatch आणि screeचा double त्रास झाला असता, so पर्याय नव्हता..

तिथून सगळ्यांनी एकत्रच जायचं ठरलं.. bag मधून torch 🔦 निघाल्या आणि शोध सुरु झाली खिंडीची, जिथून आम्हाला कुमशेतला मुक्कामी 🎪 उतरायचं होतं.. खिंडीच्या पलीकडेच कात्राबाई, तर मुक्काम खाली का? आणि मुक्काम खाली तर उद्या सकाळी परत हीच खिंड चढायची? ह्या प्रश्नांचे obvious उत्तर विशालने सकाळी भैरवगडाच्या पायथ्याशीच दिले होते.. deccan ultra च्या volunteersनी ठिकठिकाणी त्यांच्या स्पर्धकांसाठी खुणा करून ठेवल्या होत्या.. एक ठळक arrow ↙️ खाली इथून उतरा, असं स्पष्ट सांगत होता, पण आम्ही अनुभव असलेल्या खिंडीतूनच उतरायच्या निर्धाराने तिचा शोध घेत होतो..

दूरवर light 💡 दिसत होते.. "पण कुमशेत इतकं लांब नाही.. खूप remote village असल्यामुळे गावात light नाहीत.. इथून कुमशेत नाही दिसणार" हे विशालचे शब्द.. separate paragraph काढला आहे ह्या एका statement साठी.. किती महत्वाचं आहे, हे अवघड नसावं समजायला 😁 / पुढच्या paragraph मध्ये लक्षात येईलच 😜..

वाट सापडल्यावर, झालेल्या उशिराची थोडीफार भरपाई करण्याचं ठरलं.. ७ जणं पुढे जाऊन tent 🏕️️ लावतील आणि जेवणाची तयारी करून ठेवतील.. सगळे आल्यावर जेवण बनवू, खाऊ आणि झोपू.. खिंड उतरल्यावर जेव्हा पहिलं शेत लागलं, तेव्हा असं वाटलं की आता पोहोचलोच.. पण तो समज, 'गैरसमज' हुन अधिक काही असणार नव्हताच.. अजून दीड-पाऊणे दोन कि.मी. वेळ गेल्यावर आलेे - ते वरून दूरवर दिसणारे lights, दिसली ती bus 🚌 आणि दिसलं ते मंदिर 🕉️.. आता तुम्ही म्हणाल 🤔 वेळ कुठे कि.मी. मध्ये मोजता? builder / promoter जाहिरात करतांना शिवाजीनगर १० मिनिट, हिंजवडी १५ मिनिट, असं मोजतातच ना ! 😹

stretching करून ९:३० ला मंदिराच्या पटांगणात tent लावण्यात आले, चहा करण्यात आला आणि भाजी कापण्यात, सोलण्यात आली 🥗.. १०:१० पर्यंत सगळे आल्यावर rice आणि शिरा बनवण्यात आला.. भात बनवत असलेल्या यमला विशाल ने विचारलं: "पाणी किती टाकणार?" बाहुतेक उत्तर अपेक्षित होतं "अर्धा पातेलं", पण यम: "शिजण्यापुरतं".. प्रशांत उर्फ यम का जवाब नाही ! 👌

१४ फेब्रुवारी २०२१

time lapse sunrise

घर असो वा मैदान, सगळीकडची कहानी एकच.. सकाळ झाल्यावर रात्रीचा उरलेला भात आणि शिरा गरम करण्यात आला.. fresh बनवण्यात आली maggi 🍜 आणि कडक बनवण्यात आला ☕ lemon tea.. शेजारी उभे राहून लहान-सान मुलं आमचा सगळा संसार बघत होते.. त्यातल्या एकाने हिम्मत करून आमच्याकडून शिरा नेला आणि त्याचीच एक निरागस pose 🖼️️ 'pic of the day' पण ठरली.. पोटभर खाऊन, उरलेलं pack करुन, सकाळी ९ वाजता परत १-२ १-२ सुरु.. काल cricket, तर आज विट्टी-दांडू.. CTR चे shoes 👞 trekking साठी कितीजरी perfect असले तरी त्यांची lace गड उतरतांना सैल पडते आणि सुटतेच.. रोज नवीन काहीतरी शिकायचं, ह्यात काल शेवटची entry 'tent कसा लावायचा?' ही होती, तसंच आज आपण स्वतःहून सोडल्याशिवाय निघणार नाही अशी shoelace knot ➿ कशी बांधायची, हे विशालने शिकवलं.. CTR is now 'more than perfect'..


काल अंधारात 🌙 पूर्वेकडून (मुडा हून) येतांना left घेऊन दक्षिणेकडे जी उतरलो, exactly तीच साडे तीन-पाऊणे चार कि.मी. वाट उजेडात चढत आज आम्हाला खिंडीत पोहोचायचं होतं.. तिथून पश्चिमेकडे, leftला होता कात्राबाई आणि परत त्याच खिंडीत येऊन रतनगड साठी वायव्य दिशेने / उत्तर-पश्चिमेकडे जायला leftच घ्यायचा होता.. "रतनगड आपण separate plan करु शकतो, पण कात्राबाई skip नका करू".. कालच्या १८ कि.मी. नंतर काही जे यायचं नाही 🙅‍♂️ म्हणत होते, त्यांना विशालचं हेच motivation-cum-suggestion.. आजचा पहिला target होता ह्या range trek मधल्या killer viewचा, जो होता सह्याद्रीतील सर्वात खोल दरीचा, ज्याला सोबतीला समोर होते रतनगड आणि खुट्टा..

चढाच्या सुरवातीलाच कात्राबाईचं ठाणं आहे.. आणि चढ संपल्यावर जो पठार लागतो, त्याचा पसारा अफाट.. वाटेत लागले काही टहाळं, जे बऱ्याचदा नवसासाठी रचता.. त्याशिवाय घाटवाटेवर, घाटावर आणि कोकणात प्रवास सुखरूप होण्यासाठीही टहाळं उभारतात.. हिमालयात मोठे cairns जसे असतात तसेच काहीसे.. काही ठिकाणी स्मृतीप्रित्यर्थही अश्या शिळा रचलेल्या आढळतात.. top हुन दिसत होता end-to-end रतनगड.. आणि डावीकडे multiple steep ridges.. जवळून बघायला अजून थोडं खाली उतरलो.. जास्त खाली जाऊन फायदा नव्हता, कारण तोच उतार पुन्हा चढावा लागला असता आणि plan आजही मोठाच होता.. चंद्रगड ते arthur seat trekच्या वाटेत (read post here) जे views दिसतात, त्याहून प्रखर, bold, deep आणि enthralling (मोहक) 😎..

टहाळं

the drop

दरीचा drop इतका भयानक आहे की panorama mode सुद्धा लाजेल.. no exaggeration, पण 'इथून निघावं' असं वाटत नव्हतं / वाटत नाहीच / वाटू शकतही नाहीच.. पण नाईलाज.. १२:३० 
ला टहाळापर्यंत return येऊन कौस्तुभ सरांची वाट बघितली.. ते सगळीकडे आमच्या बरोबरीनेच होते, आणि त्यांनीच आल्यावर सांगितलं / म्हंटलं, "माझा रतनगड २ वेळेस झाला आहे, माझ्यामुळे तुम्हाला नको उशीर, तुम्ही व्हा पुढे".. माऊली त्यांना घेऊन येणार होता.. आम्ही ६ - स्वप्नील, यम, वैभव, राहुल, राहुल आणि मी झटपट खाली उतरुन R2Hच्या वाटेला लागलो - typing mistake नाही आहेे, राहुल २ 👦 👨 होते.. आणि हे तेच होते ज्यांच्या बरोबर मी मागच्या वर्षी lockdown आधी 🔓, फेब्रुवारीतच SRT केला होता (SRT काय? तर read post here).. R2H म्हणजे रतनगड ते हरिश्चंद्रगड, फरक फक्त हाच की आम्ही कात्राबाईहुन रतनगडला जात होतो.. हरिश्चंद्रगडची post इथे वाचा.. 

भर दुपार असून आम्हाला कुठेच ऊन लागलं नाही 🌳🌴.. ही वाट trade route 💱 म्हणून वापरायचे, म्हणजेच trekkersनी किंवा गावकऱ्यांनी ही नक्कीच बनवलेली नाही.. हळू-हळू अग्निबाण pinnacle आणि रतनगड लहानाचे मोठे होत होते (not literally).. झाडाचा नवीन प्रकार (species) आज बघायला भेटला ज्याला निळ्या रंगाची अतिबारीक फुलं-फळं होती, जी फेब्रुवारी-मार्च मध्येच फुलतात.. Memecylon umbellatum उर्फ अंजनी.. आणि, एक विशिष्ट प्रकारचा कोळी (spider) बनवतो, असे tube / funnel webs / trapdoors 🕸️️ ही वाटेत बरेच होते.. आपल्यापर्यंत एखादा किडा 🐛 सहजा-सहजी पोहोचू नये, पण कोणी जवळ आलाच तर सहज अडकावा, हा हिशोब..

अंजनी

trapdoors

'पाणी कुठलं वापरत असतील?' नेहमीच हा संशय घेऊन कधी नसेल प्यायलो, तिथे आज जवळच्याच water source वाघ तळाचं नितळ पाणी बघून निंबू लिंबू पाणी पिण्यासाठी माघे-पुढे नाही बघितलं.. वाजले होते २:१५ आणि schedule मधला शेवटचा गड - रतनगड, सह्याद्रीतील रतन 💎 - आम्हाला बोलवत होता.. दिवाळी २०१८ मध्ये रतनगडला साम्रदहुन आलो होतो (read post here), त्यामुळे गडाची ही बाजू बघितली नव्हती.. trade route सोडून आम्ही गड चढायला सुरु केला आणि आत्तापर्यंतच्या वाटेसारखं इथेही तेच.. दुपार असून ऊन नाही..

काही वेळातच गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा बघून आम्ही 👩 कात्राबाई आणि 👴 आजोबाचा killer view बघायला वर आलो.. २०१८ साली जे बघितलं / दिसलं, त्यात बदल फक्त हाच कि ह्यावेळेस आम्ही समोर दिसणाऱ्या कात्राबाई top वरून आलो आहोत, ही rewarding 🏆 अशी added sense of achievement होती.. इथून ३ डोंगरांच्या ridge थोडं निरखून आणि कल्पनेपुर्वक 💭 बघितल्या तर ३ human faces 🗿 दिसतात.. परत तेच, 'उठायची इच्छा नाही', पण.. रतनगड जरी चढलो असू तरी timepass करून चालणार नव्हतं.. टाक्याचं पाणी was below expectations, तरी emergency साठी भरून घेतलं..


कोकण दरवाज्याला भेट देत पुढे नेढ्यात पोहोचलो.. समोर AMK आता अधिक स्पष्ट दिसत होते.. ज्यांना माहिती नाही, AMK म्हणजे अलंग-मदन-कुलंग ⛰️⛰️⛰️, another high endurance 💪 trek, still a TODO (नाहीतर इथे सुद्धा 'read post here' नोंद असती).. वाजले होते ४ आणि अजून जेवायचा पत्ता नाही.. सोबत आणलेले 🥒 काकडी-गाजर 🥕 आणि सकाळची pack केलेली maggi 🍝, ह्याच available options वर ताव मारत, पुढे त्र्यंबक दरवाज्यातून उतरायचं ठरलं.. आलो तो रस्ता छोटा होता ना? हो.. मग? तर आम्हाला बघायचे होते trade route वर आजही असलेले ब्रिटिशकालीन milestones..


खुट्टा from रतनगड नेढं

साम्रद ५, पाचनई १३

अर्थातच गेल्या वेळेस रतनवाडीला आहे ते अमृतेश्वर मंदिर बघितलं नव्हतं.. आणि ते information-rich 🤑 स्वप्नील बरोबर बघायला भेटणार, म्हणून आम्हाला ही संधी घालवायची नव्हती.. sunset व्हायच्या आत पोहोचायच्या हिशोबाने, वाटेत परत त्याच ठिकाणी लिंबू पाणीचा shortest possible break घेत, आमच्याच group मधल्या बाकीच्या (६ सोडून) वारकरींना hi-hello-see-you करत, धावत-पळत रतनगड descend केला..

गडामुळे मंदिर नाही तर 🛕 मंदिरामुळे गड आहे.. अमृतेश्वरला पोहोचलो, तेव्हा सूर्य 🌥️️ गडाच्या आडोश्याला गेला होता, पण उजेड बऱ्यापैकी असल्याने आम्हाला पुष्करणी 🐟 आणि त्यातल्या मुर्त्या, मंदिर आणि त्यातलं कोरीव काम व्यवस्तीत बघायला आणि स्वप्नील मुळे अनुभवायला मिळालं.. मंदिराच्या आत असलेल्या pillars वर भारवाहक यक्ष कोरले आहेत.. वाद्ययंत्र धारण केले असता त्यांचा प्रकार / पद्धत गांधर्व आहे, असं समजलंं.. मंदिराच्या मागच्या बाजूस काही वीरघळ आहेेत आणि ठिक-ठिकाणी आपण जे दर्पणसुंदरीचं शिल्प सगळ्याच मंदिरात बघतो, ते.. 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...