Thursday, October 20, 2022

अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत

नाशिक आणि ठाणे जिल्ह्य़ांएवढे दुर्ग आपल्याकडे अन्य कुठल्या जिल्ह्य़ात नसावेत.  धार्मिक-पौराणिक शहर म्हणून नाशिक देशभरात नव्हे तर जगभरात प्रसिध्द आहे. कुंभनगरी म्हणून नाशिक-त्र्यंबकेश्वरचा नावलौकिक आहे. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिरापासून तर प्रभू रामचंद्र यांच्या वनवासकाळातील तपोभुमी पर्यंत नाशिकला पौराणिक इतिहास लाभला आहे. यात नाशिक प्रांतातील किल्ल्यांना तर त्यांच्या संख्येबरोबरच स्थानआकाराचेही वैविध्य आहे. सह्य़ाद्रीच्या मुख्य धारेपासून स्वतंत्र पोटशाखा होत धावणाऱ्या सेलबारी, डोलबारी, चणकापूर, दुंधेश्वर, त्रिंबक आदी डोंगररांगांवर या उंच गिरिशिखरांच्या दुर्गानी इथे मांदीयाळी भरली आहे.नाशिकच्या पश्चिम अंगाला सह्य़ाद्रीची एक रांग लांब-रुंद-उंच पावले टाकत गेलेली आहे. ‘त्र्यंबकेश्वर’ असे या डोंगररांगेचे नाव. अंगावर येणाऱ्या या डोंगररांगेवर त्रिंबक उर्फ ब्रह्मगिरी, वाघेरा, सोनगीर, खैराई, रांजणगिरी, भंडारदुर्ग, हरिहर अशा अनेक दुर्गशिखरांचे सुळके आकाशात घुसलेले आहेत.एकेक पर्वत – दुर्ग निव्वळ आकाशाला भिडलेला, त्याचे ते उंच कातळाचे रुप पाहतानाच जणू उरात धडकी भरावी आणि पायातील अवसान गळावे. या भूगोलाच्या आश्रयानेच मग कधी सातवाहनापासूनचा इतिहास इथे घडला आणि आमच्या पुराणकथाही या पर्वतांना चिकटल्या.  नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरीचा पर्वतही याच माळेतील. अंजनेरीचे ते अजस्त्र रुप आपल्या पुढय़ात जणू दोन्ही बाहू सरसावून उभे असते!कुणा लेखी तो इतिहासातील अभेद्य दुर्ग तर कुणासाठी तो अंजनीसूत हनुमानाचे जन्मस्थान! समुद्रसपाटीपासून १३०९ मीटर तर पायथ्यापासून ८०० मीटर उंचीवर असणारा अंजनेरी किल्ला भास्करगडापासून सुरु होणाऱ्या त्र्यंबकरांगेत येतो.
     मारुती, बजरंगबली, बलभीम, केसरीनंदन, आंजनेय, वायुपुत्र, पवनसुत, संकटमोचन अशा एक न अनेक नावांनी ज्याचा आपण उल्लेख करतो अश्या श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थळ म्हणजे किल्ले अंजनेरी.  अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत.  अंजनीमातेच्या नावावरून या गडाचे नाव अंजनेरी पडले असावे. वनवासामध्ये रामचंद्रांनी बराचसा काळ पंचवटी परिसरात घालवला असल्यामुळे नाशिकच्या आसपास अनेक रामायणकालीन स्थळे आहेत. खुद्द अंजनेरी गावातही पुराणकालीन अनेक उद्ध्वस्त मंदिरे आहेत. मुंबई, नाशिक आणि पुण्याहून एका दिवसात अंजनेरी किल्ला आणि मंदिरे पाहून होतात.


१२ ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. अंजनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर पासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकहून २३ किलोमीटरवर हा अंजनेरी दुर्ग. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी गावच्या हद्दीत. या वाटेवरीलच अंजनेरीचे प्रसिद्ध ‘मुद्रा संग्रहालय’ ओलांडले की त्यापुढे ४ किलोमीटरवर या अंजनेरी गडाकडे जाण्याचा फाटा लागतो. इथपर्यंत येण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वपर्यंत सतत धावणाऱ्या एस टी बस सोईच्या. या फाटय़ावर उतरले की लगेच एक वाट ‘हनुमान जन्मस्थान अंजनेरी’ अशी पाटी दाखवत डावीकडच्या डोंगररांगेवर निघते. काही अंतरावर एका टेकडीवर अंजनेरीची एक वस्ती. या वस्तीला खेटूनच ही वाट चार वळणे घेत थेट अंजनेरीच्या पायथ्यापर्यंत पोहोचते.
कार्तिक स्वामीं मंदीर आणी पाठीमागे अंजनेरी डोंगराचे नवरा नवरी सुळके.

कार्तिक स्वामी मूर्ती 
गणपती मंदिरात असलेले शेंदूर लावलेली विरगळ

 फाट्यापासून चालत अंजनेरी गावातील हनूमान मंदिरापाशी पोहोचायला १५ मिनिटे लागतात.अंजनेरी गड चढाईच्या दृष्टीने सोपा आहे.
 अंजनेरी गावात गडाच्या प्रारंभी बाल हनुमान व अंजनी मातेचे मंदिर आहे.अंजनेरी गावातील बघण्यासारखी गोष्ट म्हणजे सिद्ध हनुमान मंदिर. ही हनुमानाची मूर्ती १५ फुट उंच आहे. त्याची गदाच ६ फुट आहे. 

अंजनेरी गावातून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनवलेला आहे. सध्या जीप सारखे वाहान या रस्त्याने जाऊ शकते. स्वत:चे वाहन असेल तर थेट या पायथ्यापर्यंत जाता येते.गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनाने सहज जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पूर्ण करता येते.हनुमान मंदिरापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. कच्च्या रस्त्याने जाणे किंवा पायवाटेने जाणे. कच्चा रस्ता फ़िरत फ़िरत पायथ्याशी जातो, तर पायवाट हळूहळू चढत रस्त्याला मिळून पायथ्याशी जाते. पावसाळ्यात पायवाटेवर छोटे ओढे लागतात. 
 अंजनेरी गावाशेजारचे धरण 

हनुमान मंदिरा पासून थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक ठळक पाऊलवाट दिसते. या पायवाटेने साधारण २५ ते ३० मिनिटात आपण कच्च्या रस्त्याला लागतो. या रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर आपण गडाच्या पायथ्याशी असलेल्या वन विभागाच्या चौकी पाशी पोहोचतो. चौकी पासून पायर्‍यांची वाट सुरु होते. पायर्‍यांच्या साह्याने अंजनेरीच्या पठारावर आणि तेथून पुढे बालेकिल्ल्यावर पोहोचता येते. अंजनेरी गावातून बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी दॊन तास लागतात.

नाणे संग्रहालय :-

   अंजनेरी गडावर जाण्यापुर्वी आपण गावातील एका मह्त्वाच्या ठिकाणाला भेट देणार आहोत.आपला प्राचीन वारसा आणि इतिहासाचा ठेवा जपून पुढच्या पिढ्यांना हस्तातंरीत करणारे शक्ती कृष्णा  नाणे संग्रहालय. पैशांचा, नाण्यांचा उगम कसा झाला या विषयाचा इतिहास मांडणारं हे एक अप्रतिम संग्रहालय आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हे संग्रहालय व संस्था म्हणजे अंजनेरी येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज्’ (म्हणजेच भारतीय नाणेशोध संस्थान). भारतातीलच नव्हे तर जगातील नाणेप्रेमींची पंढरी!
     आपण आज जे चलन वापरतो, त्याचा साक्षात् ‘इतिहास’ या ठिकाणी जतन करून ठेवलेला आहे. अखंडित ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या आपल्या भारतीय इतिहासाचे एक वैशिष्टय़ म्हणजे नाण्यांची किमान अडीच हजार वर्षांची अखंडित परंपरा! भारतात, मौर्य कालखंडाच्याही पूर्वी इसपू. ५०० पासून नाणी पाडली जात व ती आजही उपलब्ध आहेत. प्राचीन नाण्यांचा संग्रह, अभ्यास, संशोधन, अगदी लिलाव करणारे थोडे लोक नाहीत! मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सांगली यांसारख्या ठिकाणी अनेक संस्था-संघटना हे ‘वारसा जतनाचे’ काम करीत आहेत. बस्तीमलजी सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली हे काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्लब ऑफ कलेक्टिंग रेअर आयटेम्स्’ या संस्थेचा प्रातिनिधिक उल्लेख पुरेसा ठरू शकेल. तसे पाहता नाण्यांचा संग्रह, अभ्यास १९व्या शतकापासून सुरू झाला. बाळशास्त्री जांभेकर, जस्टीन अबॉट, प्रिन्सेप इ. अनेकांचा उल्लेख या संदर्भात करता येईल. परंतु शास्त्रशुद्ध संस्थात्मक अभ्यास हा २०व्या शतकातला!

इ.स. १९८०मध्ये कमलेश के. माहेश्वरी या नाणी संग्राहक प्रेमीतज्ज्ञ अशा सुप्रसिद्ध उद्योगपतींनी नाणकशास्त्राच्या सुसंगत-शास्त्रीय अभ्यास व संशोधनासाठी भारतीय नाणेशास्त्र शोध संस्था (Indian Institute of Research in Numismatic Studies)  या संस्थेची स्थापना केली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नाशिकपासून साधारणत: २३ कि.मी. अंतरावर अंजनेरी डोंगराच्या कुशीत, निसर्गरम्य वातावरणात ही संस्था आहे. सुंदर अशा वास्तू, सुसज्ज ग्रंथालय, तारांकित वाटावे असे अभ्यागत निवास (गेस्ट हाऊस), तज्ज्ञ-सुस्वभावी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, अप्रतिम संग्रहालय अशी याची वैशिष्टय़े सांगता येतील. 
     हे संग्रहालय अंजनेरी डोंगरांनी वेढलेल्या जवळपास ५०५ एकर जागेत संपूर्ण कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. या संग्रहालयाने एक चांगला माहितीपट इतिहास बनवला आहे जो पुढील पिढ्यांसाठी फायदेशीर आहे.
माहेश्वरींच्या सोबत नाणक पितामह पितामह (कै.) डॉ. परमेश्वरीलाल गुप्त यांनीही या संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला. ते या संस्थेचे प्रथम संचालकही होते.
   
  नाणक संग्रहालय : ‘संग्रहालय’ ही संकल्पना जरी आधुनिक असली तरी त्याची पाळेमुळे ही जुन्या काळात जातात. आपल्या इतिहास, संस्कृती, गत अस्तित्वाच्या खाणाखुणा ‘पकडून’ ठेवणारे ठिकाण म्हणजे संग्रहालय! त्या अर्थाने संग्रहालय ही खरं तर एक स्मरणरंजनाची (Nostalgic) जागा होय. भारतीय नाणेशास्त्र शोध संस्थेचे ज्याप्रमाणे संशोधन, नाणक प्रशिक्षण कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे हे उपक्रम आहेत, तद्वत ‘नाणक संग्रहालय’ ही खासियत होय. रस्त्यावरूनच Money Museum ( मुद्रा संग्रहालय) हा फलक आपले लक्ष वेधून घेतो आणि संस्थेच्या प्रसन्न आवारात जाताच आपण एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतोय, याची जाणीव होते. ‘पैसा व नाणी’ यांच्या संग्रहालयात प्रवेश करताना आपण याच पैशासाठी धावतोय हे पाहणारा काही काळ तरी विसरून जातो व एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.
               पुरातत्त्वशास्त्राचे महान पीठ असलेल्या डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या एका विधानाची या ठिकाणी प्रकर्षांने आठवण होते. ते म्हणतात की इतिहास, पुरातत्त्व, नाणकशास्त्र या विषयांची खऱ्या अर्थाने जनसामान्यांची नाळ जुळली पाहिजे. लोकाधार-प्रेम मिळाला तर या विषयाची अधिक जाणीव-जागृती व प्रगतीही होऊ शकेल. त्यासाठी मात्र या विषयांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचायला हवे. अंजनेरीची नाणेशास्त्र शोध संस्था नाण्यांबाबत हे कार्य बिनचूकपणे करीत आहे. दिवसागणिक किमान एक बस भरून माणसे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येतातच. खासगी पर्यटक वेगळे. जनसामान्यांपर्यंत चलनाचा इतिहास पोहचवण्याचे कार्य हे संग्रहालय अविरतपणे करीत आहे. रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता, हे आगळंवेगळं संग्रहालय सकाळी ९.३० ते १.०० व दुपारी २.०० ते ५.३० या वेळात प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले असते. आशिया खंडातील हे अशा प्रकारचे सध्या तरी एकमेव संग्रहालय आहे व संस्थाही एकमेवाद्वितीय अशीच आहे. खरं तर संस्था व संग्रहालय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेवटी दोहोंचे कार्य एकच-भारतीय नाणी, चलन यांचा संग्रह, अभ्यास, ज्ञानप्रसार व लोकाभिमुखीकरण!

मुद्रा संग्रहालयातील नाण्यांविषयी
     नाणक पितामह (कै.) डॉ. परमेश्वरीलाल गुप्त यांच्या मते, आहत (Punchmarked) नाणी ही भगवान बुद्धांच्या म्हणजे इसपू. ६००-७०० इतकी जुनी आहेत. (परमेश्वरीलाल गुप्त यांनी यावर प्रबंध लिहिला आहे, विशेष म्हणजे हा प्रबंध प्रवासात हरवला असता त्यांनी तो पुन्हा लिहून पदवी मिळवली, ही तळटीप). अतिप्राचीन अशा या आहत नाण्यांवर कोणतीही लिपी वा मजकूर नसून फक्त सूर्य, चंद्र, झाड अशी चिन्हे आहेत! अंजनेरीच्या संग्रहालयात ही नाणी दिमाखात विराजमान आहेत. त्यांना पाहताना आपण सम्राट अशोकाच्या काळात कधी पोहोचलो हे आपणांसच समजत नाही. अर्थात या संग्रहालयात प्रामुख्याने ताम्रमुद्रा जास्त ठेवल्या आहेत.
सोने, चांदीची मौल्यवान नाणी संस्थेच्या तिजोरीत सुरक्षित आहेत. त्यांच्या जागी मात्र हुबेहूब प्रतिकृती ठेवल्या आहेत. भरपूर माहितीपूर्ण छायाचित्रे, तक्ते, नकाशे यांनी परिपूर्ण असे हे संग्रहालय असल्याने चलनाचा इतिहास आपल्या डोळय़ासमोर तरळतो.

               आहत नाण्यांच्या नंतरच्या काळात भारतात आलेल्या परकीय ‘इंडो-ग्रीक’ राजांची नाणी ही कलात्मकदृष्टय़ा अत्यंत सुंदर आहेत. त्यांच्यावर एका बाजूस राजाचा अर्धपुतळा तर दुसरीकडे देवदेवतांचे चित्रण दिसते. ही नाणी आपणांस येथे पाहायला मिळतात. याप्रमाणेच महाराष्ट्राचे ‘पहिले राजे’ सातवाहन या राजघराण्याच्या उल्लेखाशिवाय नाण्यांचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही! ज्याचे घोडे तीन समूहाचे पाणी प्यायले आहेत, अशा गौतमीपुत्र सातकर्णीसारख्या पराक्रमी राजांचा इतिहास येथे नाणकरूपाने जतन आहे.
गुप्त राजांच्या नाणेरूपी सुवर्णयुगाच्या आधी भारतात राज्य केलेल्या कुषाण राज्यांची नाणी हीसुद्धा वैशिष्टय़पूर्ण होत. मानवी देहधारी शिव, कनिष्क या सम्राटाचा ‘सर्वधर्मसमभाव’ हाही आपणास कुषाणांच्या नाण्यांवर दिसतो.
गुप्त राजांची खास ‘देशी कलात्मक’ नाणी त्यानंतरच्या काळातील. त्याला नाणकशास्त्र उतरणीला लागलेला काळ (when numismatics lost its glory) अशा वर्णनाने ओळखले जाते, त्यातीलही नाणी पाहावयास मिळतात.
भारतीय इतिहासाच्या मध्यमयुगीन काळातील दिल्ली सुलतान, मुघल यांची पर्शियन उर्दू लिपीतील नाणी त्यावरील टांकसाळींची नावे, राजांची बिरुदे ही समजून घेण्यासाठी प्राचीन नाण्याप्रमाणेच, मध्ययुगीन भारतीय नाण्यांवरील लिपी शिकविणारा अभ्यासक्रमही या संस्थेत उपलब्ध आहे. संग्रहालय पाहून कोणा व्यक्तीस अधिक जिज्ञासा निर्माण झाली तर संदर्भपूरक ग्रंथालय व नाण्यांची प्रकाशचित्रे असणारी तालिका (catalogue) येथे उपलब्ध आहे. मराठा कालखंड हा तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा खास जिव्हाळय़ाचा कालखंड. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ साली राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर पाडलेले ‘होन’ व ‘शिवराई’ आपणांस पाहावयास मिळतात. स्वत:च्या नावाचे चलन पाडणे हे मध्ययुगीन पद्धतीनुसार स्वातंत्र्य उद्घोषित केल्याचे एक लक्षण होते याची जाणीव ‘शिवराई’ नाणी पाहताना होते.
       या संग्रहालयाची खासियत म्हणजे केवळ नाणीच नव्हे, तर नाणेरूप चलनापूर्वीच्या वस्तुविनिमय, धातु विनिमय, कवडी इ. चलनपद्धतींपासून ते एटीएमपर्यंतचा चलन प्रवास आपणांसमोर उलगडतो.
भारतीय नाणेशास्त्र शोध संस्थेच्या या विलक्षण संग्रहालयाची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे या विषयात ज्याची रुची निर्माण झाली आहे अशांसाठी संस्थेची नाणकविषयक प्रकाशनेही येथे विकत मिळू शकतात. संस्थेचे संचालक डॉ. अमितेश्वर झा, डॉ. दानेश मोईन व त्यांचे आजी-माजी सहकारी यांनी परिश्रमपूर्वक संशोधन करून जी गं्रथसंपदा निर्माण केली आहे ती येथे पाहावयास मिळते. अमितेश्वर झा यांच्या ‘भारतीय सिक्के, एक ऐतिहासिक परिचय’ या आशयाचे शीर्षक असणारे पुस्तक नवख्यापासून ते मुरब्बी संशोधकापर्यंत सर्वाना उपयुक्त असे आहे. १९८४ सालची ‘नाणी व इतिहास’, ‘१९८७ सालची’, ‘नाणी व पुरातत्त्वशास्त्र’, ‘१९९१ सालची नाणी व व्यापार’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळांचे अहवालही पाहावयास मिळतात व त्यातून संस्था व संग्रहालयाचे नाणक शास्त्राला शास्त्रीय बैठक देण्याच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते.
या संग्रहालयाच्या जोडीला आदिम अशा गुहाचित्रांचा तसेच पुरातत्त्वीय विषयांचा अभ्यासही या ठिकाणी सतत चालू असतो.
                       ‘भारतीय नाणक शास्त्राची मूलत्त्वे’ या पंधरा दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी (ज्याला मर्यादित जागा प्रवेश असतो.) देश-विदेशांतून शेकडो अर्ज येतात. या अभ्यासक्रमात प्रत्येक नाण्यांची हाताळणी, वर्गीकरण, वाचन, तालिकीकरण अशा अनेक विषयांचा समावेश असतो. नाण्यांचा अभ्यास कसा करावा हा ज्या प्रमाणे या कार्यशाळेचा हेतू आहे त्या प्रमाणे संग्रहालयात काही वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. उदा. नाण्यांच्या अभ्यासाचे ‘ट्रे’. ते या संग्रहालयात पाहावयास मिळतात.
थोडक्यात जुनी नाणी, मुद्रा, चलन यांचा इतिहास त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी या आगळय़ावेगळय़ा विषयास वाहून घेतलेल्या संग्रहालयास अवश्य भेट द्यावी.
हे संग्रहालय सोमवार ते शनिवार उघडे आहे: सकाळी 9.30 दुपारी 1.00 आणि दुपारी 2.00 पर्यंत संध्याकाळी 5.30 पर्यंत
बंद: रविवार आणि सुट्ट्या.
कोणतेही प्रवेश शुल्क आवश्यक नाही.
  
   अंजनेरीचे हे नाणे संग्रहालय पाहून आता जाउया हनुमान जन्मस्थानाकडे अर्थात अंजनेरी गडावर. अंजनेरी, उंची १३०० मीटर किंवा ४२६५ फूट! मुख्य डोंगररांगेला चिकटलेली दक्षिण बाजू सोडल्यास तीनही बाजूंना केवळ उभा कातळ. या अंजनेरीच्या अलीकडे त्याला खेटून आणखी एक पर्वत नव्वद अंशाचा कोन करून उभा. त्याच्या शिरी पुन्हा सुळके. यातील पहिले दोन, ‘सासू’ आणि ‘नवरी’ च्या नावाने, तर या दोन्हींपेक्षा उंच असलेला ‘नवरदेव’ नावाने परिचित! आमच्या लोककथांनी या पर्वत रचनांना जागोजागी दिलेली ही अशी नावे. मग त्याचा दाखला देत इथेही ती वऱ्हाड लुप्त झाल्याची कथा ऐकण्यास मिळते. आपण आपली ती कथा ऐकायची आणि आकाशात उंच जागी स्थिरावलेल्या या सुळक्यांकडे गूढ नजरेने पाहत पुढे निघायचे.त्यापैकी उजव्या सुळक्यावरील मंदिरापर्यंत जाता येते. फक्त मागच्या बाजूने कातळवाट आहे, असे  गावकर्‍याकडून समजते. 
Let us know: 4 thousand feet of Anjaneri fort in Nashik, familiar with the birth place of Hanuman | जाणून घेऊया : हनुमान जन्मस्थळाने परिचित नाशिकमधील चार हजार फूटी अंजनेरी गड


   
  

नवरा नवरी सुळके डावीकडे  धोपट वाट 
 
अंजनेरीची पर्वतरांग 
गावचं सौंदर्य
अंजनेरीला जाण्यासाठी सर्वात योग्य ऋतू म्हणजे पावसाळा. मुळात हा गड सोपा असल्यामुळे पावसाळ्यातही जाता येऊ शकते. सोबतीला धबधबे असतातच.  अंजनेरी गडाचे साधारणपणे तीन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे गडाचा पायथा. अंजनेरी गडावर जाण्यासाठी असलेली वाट पुर्वी बिकट होती; मात्र वनविभागाने गडाचे महत्त्व नैसर्गिकदृष्ट्या तर ओळखलेच मात्र धार्मिकदृष्ट्याही जाणले. 
गडावर जाण्यासाठी गावापासून मुरूम टाकून संरक्षक भिंत बांधून वाट तयार करण्यात आली आहे. या वाटेने दीड किलोमीटरचा डोंगर सहजरित्या वाहनाने चढता येतो. 
त्यानंतर मुख्य गडावर चढाईचा मार्ग गिरीप्रेमी व हनुमान भक्तांचे स्वागत करतो.दुसरा भाग म्हणजे गडाची माची अथवा पठार.
 पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरापर्यंत जायला पायऱ्या व पायवाट आहे. इथुन गडाचा तिसरा भाग म्हणजे गडाचा बालेकिल्ला. तिसऱ्या भागातील गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अंजनेरी गाव ओलांडून एक कच्चा रस्ता किल्ल्याकडे जातो. किल्ल्याच्या आजूबाजूला दिसणारे नवरा-नवरी व सासू असे सुळके बघत आपण किल्ल्याच्या पायथ्याला असणाऱ्या वनखात्याच्या चौकीपाशी येऊन पोहोचतो. इथे पर्यटकांची नोंद होते व बॅग्ससुद्धा तपासल्या जातात. वनाधिकारी सगळ्यांना सूचना देतात माकडांना काही खायला घालू नका कचरा करू नका प्लास्टिक असेल तर आपल्यासोबत परत आणा.तसेच प्रवेश फि घेतली जाते.कॅमेरा असेल तर जादा शुल्क आकारले जाते. 


या ठिकाणी काही खाण्याचे पदार्थ विकणारी दुकाने आहेत. नाशिक वनविभागाच्या अखत्यारितीत असलेला अंजनेरी गड हा संपूर्णपणे राखीव वन संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. अंजनेरी गडावर रात्रीचा मुक्काम अथवा कुठल्याहीप्रकारे ज्वालाग्राही पदार्थ किंवा प्लॅस्टिक अथवा नशेच्या वस्तू घेऊन जाणे प्रतिबंधित केले आहे. वन संवर्धन कायदा व वन्यजीव संवर्धन कायद्यांतर्गत अंजनेरी गडाचा प्रदेश संरक्षित म्हणून नाशिक पश्चिम वनविभागाने घोषित केला आहे.पायर्याच्या सुरुवातीला वनविभागाने अंजनेरी गडाचे नैसर्गिकदृष्ट्या असलेले महत्त्व तेथे आढळणाºया वनौषधी, वन्यजीव संपदा, वृक्ष संपदेची माहितीफलक लावले आहेत. तसेच अंजनेरी गडावर जाताना पाळावयाचे नियम व घ्यावयाची दक्षता याविषयी माहिती देणारे सुचना फलक आहेत.दुतर्फा वृक्षारोपण, बसण्यासाठी ओटे, विश्रांतीसाठी राहुटय़ाही उभारलेल्या होत्या. आपल्याकडे असे चित्र आश्चर्याचा धक्का देणारेच म्हणावे लागेल !



   पायथ्याशी येताच डोंगराची विशालता आपल्या डोळ्यात भरते. मुख्य डोंगररांगेला चिकटलेली दक्षिण बाजू सोडल्यास टेंकडीच्या सर्वच बाजूस ताशीव कडे असल्याने या किल्ल्याला तटबंदीची तशी गरज पडली नाही. अंजनेरीच्या अगदी पायथ्याशी आंब्याची तीन मोठाली डेरेदार झाडे. मे-जूनच्या महिन्यात त्याला शेकडो गावठी आंबे लगडलेले असतात. या झाडांखालीच थोडी विश्रांती घ्यायची आणि गडाला भिडायचे. अंजनेरीच्या पूर्व अंगाकडून सुरू होणारा हा पायरीमार्ग त्याला वेढा घालत दक्षिण दिशेने वर चढतो. वनखात्याच्या चौकीपासून किल्ल्यावर जाणारा पायरीमार्ग सुरु होतो. काही जुन्या तर काही नवीन पायऱ्या चढत किल्ल्याची उभी चढण सुरु होते. 

पायर्‍या एका कड्याच्या पायथ्याशी येऊन पोचतात. अंजनेरीच्या वाटेवरचा सर्वात थ्रिलींगचा पॅच जर कुठला असलाच तर तो हा आहे. कड्याच्या पायथ्याला वळसा घालून आपण दर्शनी भिंत आणि अंजनेरीचे पठार यांच्या मधल्या घळीत पोचतो. 



 
    याठिकाणी कमी अधिक उंचीच्या पायर्या कातळात कोरलेल्या आहेत. त्यावर कॉंक्रीट ओतून मुळ पायर्‍यांचे सौंदर्य तर घालवले आहेच पण त्यांची उंचीही वाढलेली आहे. येथेच काही ठिकाणी सुरक्षेसाठी वनखात्याने लोखंडी कठडे बांधलेले आहेत. गडाची ही उभी चढण पायऱ्यांमुळे काहीशी सुसह्य़ वाटते. कड्याच्या पायथ्याला वळसा घालून आपण दर्शनी भिंत आणि अंजनेरीचे पठार यांच्या मधल्या घळीत पोचतो.
 घळीच्या वाटेवर कातळावर रंगवलेली हनुमान मूर्ती दिसते.धापा टाकतच चढाईच्या शेवटच्या टप्प्यात यावे तो समोर खोदलेली एक नाळच दिसते. जुन्नरच्या हडसर किल्ल्याची आठवण करून देणारी. या नाळेत पायऱ्या खोदलेला प्राचीन मार्ग होता. परंतु नुकतेच काही वर्षांपूर्वी या मार्गावर ‘सिमेंट काँक्रिट’च्या पायऱ्या ओतल्याने हा मार्ग आता बुजला गेला आहे. . 
    दोन्ही अंगांचे, अंगावर येणारे कडे झेलत वर चढताना एकदम गूढ देशी आल्याचा अनुभव येतो. आकाशात शिरलेल्या त्या कडय़ांवर नजर ठेवत त्या वळणदार नाळेतून वर यावे तो डाव्या हाताला अचानक एक खोदीव दालन डोळे मिचकावत पुढे येते. एवढय़ा दूर उंच जागी मानवनिर्मित इतिहासाचा हा पहिला थांबाच मन सुखावून टाकतो.

   
 या पायऱ्या अर्ध्या उंचीपर्यंत चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक छोटी गुहा व जमिनीपासून १० फुट उंचीवर या गुहेत जाण्यासाठी खोदलेल्या पायऱ्या दिसतात. पार्श्वनाथ दिगंबर जैन १००८ यांची ही गुहा आहे. या लेण्यात दोन दालने असुन बाहेरच्या दालनात भैरव आणि हनुमानाचे शिल्प तर छतावर अर्ध्या मीटर व्यासाचे कमळपुष्प कोरलेले आहे. 


सुरुवातीलाच एक जैन गुहा असून त्यात बरीच शिल्पे कोरलेली आहेत. हे जैन लेणी म्हणून परिचित असून १०८ जैन लेणी आहेत असा उल्लेख आढळतो.

.
गुहेच्या तोंडाशीच वरती २ फुट व्यासाचे चक्र कोरलेले आहे. 

गर्भगृहाचे प्रवेशद्वारावर नागशिल्प, कीर्तिमुख आणि अन्य भौमितिक आकृत्यां कोरल्या आहेत तर दोन्ही अंगांना द्वारपालांची रचना आहे. आतील दालनात मधोमध पद्मासनातील पार्श्वनाथाचे अर्धा मीटर उंचीचे शिल्प आणि दोन्ही बाजूंना अन्य दहा मूर्ती आहेत. गर्भगृहातील या शिल्पाशेजारी एक संस्कृत शिलालेख आहे जो या लेण्याची माहिती देतो. सौन्देव राजाच्या मंत्र्याने इ.स.११४१ मध्ये या लेण्यासाठी देणगी दिली. राजाश्रयातून खोदली जाणारी लेणी आणि किल्ले यांचे नाते इथेही दिसून येते. लेण्याच्या बाजूला पाण्याचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. हे लेणे पाहून उरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका विस्तिर्ण पठारावर पोहोचतो.

    लेणीपासून पुढे काही अंतर चालून गेल्यास गडाच्या कातळाच्या मागील बाजूच्या पठार जणू दुर्गप्रेमी व हनुमान भक्तांचे विश्रांतीस्थळ म्हणून स्वागत करते. पठारावर काही वेळ विश्रांती घेतल्यास तेथून पुढे पंधरा मिनिटाची चढण पार करुन अंजनी मातेच्या मंदिरापर्यंत पोहचता येते. गडाच्या माथ्यावर पोहचल्यानंतर गडाचा विस्तार तर लक्षात येतोच मात्र सभोवतालच्या परिसरातील गंगापूर, वैतरणा, मुकणे, काश्यपी-गौतमी धरणांचा अथांग जलसागराचे सौंदर्यशाली चित्र डोळे दिपवून जाते.

           आपण किल्ल्यावर पोहोचलो असे वाटत असतानाच आपल्याला अंजनेरी किल्ल्याचा भव्य बालेकिल्ला दिसू लागतो आणि मग लक्षात येते कि आता पर्यंत जे चढून आलो ती फक्त किल्ल्याची माची आहे आणि गडमाथा अजून बराच लांब व उंचावर आहे. किल्ल्याचा माचीसदृश हा परिसर म्हणजे एक भव्य पठाराच आहे. माचीवर जेथे आपला गडप्रवेश होतो तिथे भग्न दरवाज्याचे काही अवशेष मात्र जरा डोळसपणेच शोधावे लागतात. किल्ल्याच्या या भव्य पठारावर ऐतिहासिक बांधकामांचे काही अवशेष विखुरलेले आहेत मात्र पूर्ण माची फिरण्यासाठी व हे अवशेष शोधण्यासाठी एक पूर्ण दिवस हाताशी ठेवावा लागतो. पठारावर येताच एवढावेळ कोंडलेला तो वारा एकदम अंगाला झटा देऊ लागतो. पावसाळ्यात आले, की या वाऱ्याबरोबर पाऊस आणि ढगांचे लोटही चारही बाजूने घेरू पाहतात. 
या साऱ्याला तोंड देतच पुढची वाट काढायची.माचीवर वाहणारा थंडगार वारा अंगावर घेत बालेकिल्ल्याकडे जाण्याऱ्या पायवाटेने चालू लागल्यावर घडीव दगडात बांधलेले अंजनी मातेचे मंदिर व एक बांधीव टाके लागते. 

मंदिरात नवीन बसवलेली अंजनी मातेची व समोर नतमस्तक झालेल्या हनुमानाची मूर्ती आहे. हे मंदिर मुक्कामास योग्य असून १० जण येथे निवांत झोपू शकतात.या मंदिराच्या पुढय़ातच पाण्याचे टाके. पण ऐन पावसाळ्यातही त्याने पाण्याची साथ सोडलेली. मंदिराजवळ खाण्याचे आणि पूजा साहित्याची दोन दुकाने आहेत. येथे जेवणाची सोय होते.गडावर आजही हनुमानाची वानरसेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल मुखाच्या माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. अंजनी मातेच्या मंदिरापासून तशीच मळलेली पायवाट पुढे एका मोठया तलावापाशी जाते. 


हा तलाव हनुमानतळे आणि इंद्रकुंड या नावाने ओळखला जातो. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची फक्त इतकीच सोय आहे.हनुमानाने सुर्य पकडायला येथून झेप घेतली तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा आकार उमटून त्याचे आज तळे आहे असे लोकांकडून कळले. हनुमानाने या ठिकाणी पाऊल ठेवल्यामुळे तलावाचा आकार पाऊलाप्रमाणे आहे अशी लोकांची श्रध्दा आहे. (तलावाचा आकार दिसण्यासाठी बालेकिल्ल्याचा डोंगर चढुन जावा लागतो) हे तळे वर्षभर पाण्याने भरलेले असते. त्याच्या काठावर अनेक घरांची जोती दिसतात. या बांधकामासाठी वापरलेल्या चुन्याच्या घाणीचे चाकही इथे पडलेले आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी दोन वाटा लागतात. जर हि अंजनेरीची सैर पावसाळ्यात केली तर  झाडांबरोबरच ढगही गर्दीही इथे दिसते. ढगांच्या या दाटीतून पुढे सरकत असतानाच असंख्य रानफुलेही लक्ष वेधून घेऊ लागतात. सोनकी, कवल्या, नागफणी आदी पावसाळी रानफुलांचा हा बहर. यातील जागोजागी फुललेल्या पांढऱ्या – जांभळ्या रंगातील नागफणीच्या फुलांनी तर जणू आकाशीचे चांदणेच खाली उतरल्यासारखे वाटते.
    तळ्यापासून उजवीकडे वर जाणारी वाट अंजनेरीच्या बालेकिल्ल्यावर जाते तर डावीकडील दाट झाडीत जाणारी वाट माचीवरील आश्रमाकडे व सीता गुंफेकडे जाते. आपण प्रथम डावीकडील पायवाट धरून आश्रमाकडे चालायला लागायचे. आश्रम परिसरात हल्लीच बांधलेली हनुमान, गणपती व दत्ताची छोटी मंदिरे आहेत. अनेक वृक्षवेलींच्या छायेतील हा आश्रम, सारवलेले अंगण-प्रांगण, भगव्या वस्त्रातील शिष्यगणांची धावपळ, गाय -वासरांची धांदल हे सारेच चित्र मन प्रसन्न करत असते. बर्यापैकी मोठा आश्रम असून मस्त परीसर आहे. पाणी वैगरे सोय आहे तसेच राहण्याची सोयची होऊ शकते. 

याच आश्रम परिसरात नुकतीच बांधलेली हनुमान, गणपती व दत्ताची छोटी मंदिरे आहेत. हा सर्व आश्रम परिसर इतका सुंदर, रमणीय व मनाला भुरळ घालणारा आहे कि येथून आपला पाय निघता निघत नाही.
 मात्र येथे असणाऱ्या माकडांपासून सावध राहावे लागते कारण काही वेळातच आपली शांतता भंग करण्यासाठी मोठ्या संख्येने ते हजर होतात.या आश्रमामागेच अंजनेरीवरील आणखी एक नवल दडले आहे- सीता गुंफा!

डावीकडच्या वाटेने वळल्यावर १० मिनिटांतच आपण सीता गुहेपाशी येऊन पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या कड्यातच सीता गुंफा कोरलेली असुन  प्रवेशद्वाराच्या बाजूस द्वारपालाच्या भूमिकेत एक कुटुंब. छोटय़ाशा या लेण्यात राम, लक्ष्मण, हनुमान, भैरव, महिषासुरमर्दिनी आदी देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या शिल्पांचा दर्जा पाहता ती नंतरच्या कालखंडात कोरलेली असावीत असे वाटते. अंजनीमातेने याच गुहेत हनुमानाला जन्म दिला अशी श्रद्धा आहे. या गुहेमध्ये अंजनी आणि सीतामाईची भेट झाली असे सांगतात. 
आश्रम व सीता गुंफा परिसराची भटकंती करून पुन्हा हनुमान तळ्यापाशी परत यायचं आणि उजवीकडे जाणारी बालेकिल्ल्याची वाट चालू लागायची. पायऱ्यांची ही वाट म्हणजे खडी चढाई असुन वनखात्याने येथे रेलिंग लावलेल्या आहेत.
 बालेकिल्ल्याचा डोंगर चढताना साधारण पाऊण उंचीवर गेल्यावर डाव्या बाजूला एक पायवाट एका गुहेकडे जाते. त्या वाटेवर हनुमान जन्मस्थान अशी पाटी आहे. या पायवाटेने पुढे गेल्यावर एक प्रशस्त गुहा पाहायला मिळते. गुहेच्या बाहेर झाडावर घंटा टांगलेली असुन गुहेपाशी गदा आणि गुहेमध्ये अंजनी मातेची शिळासदृश मूर्ती आहे. मग एखादी स्थानिक व्यक्ती इथेच आपल्याला ती हनुमान जन्माची कथा ऐकवते आणि मग या इतिहास-भूगोलाला पुराणाचीही जोड मिळते.




. हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. 

टेहळणीसाठी या गुहेचा उपयोग होत असावा. मुक्कामी ट्रेक असला तर १०-१२ जण या गुफेत राहू शकतात. सध्या एका साधूने यात आपले बस्तान बसवलेले असुन गुहेच्या पुढे एक पाण्याचे टाकेही त्याने बनवलेले आहे. 
याच गुहेत नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी वास्तव्यास असताना खोदलेली पाण्याची कुंडे इथून जवळच आहेत  (नवनाथांच्या पोथीमध्येही याचा उल्लेख आहे, म्हणे!) कमी अधिक खोलीची एकूण अकरा कुंडे आहेत. काही काही बर्‍यापैकी खोलही आहेत असे वरून डोकावल्यावरही जाणवते. वास्तविक हि रांजणकुंडे आहेत.
गुहा पाहून परत पायऱ्यापाशी येऊन वर चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पठारावर पोहोचतो. 
अंजनी पठार
अंजनी मातेचे देऊळ




अंजनेरी पर्वतावरील हनुमान जन्मस्थान

Birth Place of Lord Hanuman




माचीच्या पठाराप्रमाणे बालेकिल्ल्याचे पठारही विस्तीर्ण आहे. पठारावरून १० मिनिटे चालल्यावर आपण हनुमानाच्या मंदिरापाशी पोहोचतो. या मंदिरात अंजनी मातेच्या मांडीवर बालहनुमान बसलेला दाखवला आहे. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. याच ठिकाणावरून हनुमंताने सूर्याकडे झेप घेतली होती असे इथले लोक सांगतात.
मंदिराच्या बाजूला एक पाण्याचे बांधीव टाके आहे. मंदिरासमोर व शेजारी उघड्यावर काही मुर्ती आणि पिंड ठेवलेली असुन मंदिरामागे उध्वस्त इमारतींचे चौथरे आहेत. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते.
सह्याद्रीत जे नियमित भटके आहेत, त्यांना एक गोष्ट सुपरिचित असते, ती म्हणजे दाट जंगल असलेल्या वाटेवर किंवा चुकण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी एकावर एक छोटे दगड रचून वाट चुकू नये म्हणून केलेल्या खुण केलेली असते. एक प्रकारे हि निरपेक्ष सेवाच म्हणता येईल. अंजनेरी माथ्यावर अशा अनेक दगडांचे अनेक मनोरे दिसतात. यांचा अर्थ वेगळाच आहे. देवाला नवस बोलल्यावर हे उभे केले जातात. याचा देवासाठी मतितार्थ असा की 'नैसर्गिक क्रियेमुळे (वारा, पाऊस इत्यादी) हे एकावर एक ठेवलेले दगड कोसळायच्या आत मनातील इच्छा पूर्ण कर' !

 गडाचा विस्तार प्रचंड असून त्यावर इतर कोणतेही अवशेष नाहीत मात्र येथून सभोवतालचा परिसर फार सुंदर दिसतो.  बालेकिल्ल्यावर या मंदिरा व्यतिरिक्त तसे कोणतेही अवशेष नाहीत मात्र येथून सभोवतालचा परिसर फार सुंदर दिसतो. जवळच असणारा ब्रम्हगिरीचा डोंगर आणि त्याचा उपदुर्ग असणारा दुर्गभांडार डोळे भरून पहावा तो अंजनेरी वरूनच. ब्रम्हगिरीच्या मागे मग त्र्यंबकरांगेतले हर्षगड व बसगड हे किल्ले तर ब्रम्हा डोंगर आणि उतवडचा डोंगर दिसतात. दुसऱ्या बाजूस डांग्या सुळका, रांजणगिरी, गडगडा, बहुला, वाघेरा, सोनगीर, खैराई असे एक न अनेक दुर्ग दिसतात.
   पूर्ण किल्ला फिरायला आणि व्यवस्थित पाहायला अंजनेरी गावातून ६ ते ७ तास तरी लागतात. किल्ल्यावर जेवणाची व्यव्यस्था नाही पण आश्रमातील लोकांना विनंती केल्यास व आगाऊ कल्पना दिल्यास दोन तीन जणांची जेवणाची व्यवस्था करतात. रात्र मुक्कामासाठी भरपूर जागा उपलब्ध आहेत. असा हा प्राचीन अंजनेरी गड त्याच्या ऐतिहासिक व पौराणिक पार्श्वभूमीमुळे तसेच येथील आल्हादायक वातावरणामुळे एक दिवसाची सवड काढून नक्की अनुभवावा असाच आहे. 
 गडाची सफर झाली तरी एक दुर्ग म्हणून अंजनेरीवर जवळपास काहीही अवशेष नाहीत. पण इतिहासात या गडाचे स्पष्ट उल्लेख आहेत.अंजनेरी किल्ल्याचा इतिहास शोधताना मूळात त्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावाचा भूतकाळ विचारात घ्यावा लागतो. अंजनेरी हे प्राचीन काळापासून एक राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे केंद्र होते. यादवांच्या काळात या परिसराचे महत्त्व आणखी वाढले. या प्राचीन कालखंडाचे अवशेष आजही गावात आढळतात. अंजनेरीत हिंदू आणि जैनांची प्राचीन सोळा मंदिरे आहेत. प्राचीनकाळी भरभराटीला आलेल्या अंजनेरी नगरीच्या रक्षणासाठी हा किल्ला निर्माण झाला असावा. गडावरील प्राचीन खोदकाम व अंजनेरीच्या पायथ्याशीं असणारे मंदीर समूह पाहता राष्ट्रकूट- चालुक्यांच्या काळापासून हा गड नांदत असावा. इ.स. २६० च्या सुमारास अंजनेरी ही या भागात राज्य करणाऱ्या ईश्वरसेन (वीरसेन) या अभिर गवळी राजाची राजधानी असल्याचा कोरीव लेख पांडवलेण्यात आहे. त्यांची चांदीची नाणीही उपलब्ध आहेत. याशिवाय अंजनेरी परिसरात मिळालेल्या दोन ताम्रपटातही या किल्ल्यावर इ.स. ७१० मध्ये बदामीच्या चालुक्यांची हरिश्चंद्रवंशीय घराणे राज्य करत होते याचे उल्लेख आले आहेत. या ताम्रपटात स्वामीचंद्र, सिंहवर्मन आणि भोगशक्ती किंवा पृथ्वीचंद्र असे तीन राजांचे उल्लेख आहेत. इ.स. ७१० च्या ताम्रपटात अंजनेरी जवळच्या विविध देवालयांसाठी परिसरातील गावांवर बसवलेल्या करांचा उल्लेख आहे. सिन्नर येथील यादव राजांच्या काळात सेऊणचंद्र ३ रा याने इ.स.११३० ते ११४५च्या सुमारास अंजनेरीहून काही काळ कोकणचा कारभार पाहिला होता. त्यांच्या कारकिर्दीत ११४१चा शिलालेख उपलब्ध आहे. अंजनेरी आणि परिसराला जैन परंपरेत श्वेतप्रद असे म्हणत. इ.स. १०-११ व्या शतकात यादवांच्या काळात या परीसरात अनेक ठिकाणी लेण्या कोरल्या गेल्या. पुढे मुस्लीम सत्तांच्या काळातही अंजनेरीचे उल्लेख येतात. १५०८ ते १५५३ याकाळात हा गड अहमदनगरच्या बुऱ्हाण निजामाकडे होता. निजामशाहीने अल्पवयीन निजामशहाला या किल्ल्यावर काही काळ सुरक्षित ठेवले होते असा उल्लेख येतो. शिवकाळात मोरोपंत पिंगळे यांनी इ.स. १६७० ऑक्टोबरमध्ये त्रिंबकगडाबरोबर अंजनेरी किल्ला स्वराज्यात आणला. मोगल-मराठा संघर्ष काळात अंजनेरी किल्ल्याचे त्रोटक उल्लेख येतात. पुढे १७५० मध्ये हा गड निजामाच्या ताब्यात गेला. पेशवे काळात राघोबादादा यांनी गडावरील सपाटी आणि हवामानाची भुरळ पडून मुक्कामासाठी गडावर एक वाडा बांधला. मराठय़ांनंतर इंग्रज अधिकारीही गडावर राहण्यासाठी येत असत. इंग्रजांनी हनुमान तळ्याच्या काठावर थंड हवेचे ठिकाण म्हणून एक बंगला बांधला होता त्याचे अवशेष आजही दिसतात.
    विशेष म्हणजे अंजनेरी गड १८ व्या शतकाच्या शेवटी बेवसावू झाला असावा.कारण २४ एप्रिल १८१८ ला इंग्रजांनी याच परिसरातील त्रिंबकगड घेतल्यावर सभोवतालच्या सोळा गडांनी शरणागती पत्करली, त्याची यादी नाशिक जिल्हा गॅझेटीयरमध्ये दिली आहे.मात्र या यादीत अंजनेरी गडाचे नाव नाही.याचा अर्थ अंजनेरी गड आधीच वापरात नसल्यामुळे तो ब्रिटीशांनी ताब्यात घेण्याचा प्रश्नच आला नसावा. मात्र इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी यांच्या मते अंजनेरीचा अंजराई असा झालेला आहे.मात्र अंजराई म्हणजे इंद्राई. कारण धोडपवर अलिवर्दीखानाने जो शिलालेख कोरला आहे, त्यात इंद्राईचा अंजराई असा केलेला आहे.याचा अर्थ पेशवाईच्या शेवटी अंजनेरी हा गड म्हणून वापरात न रहाता, बहुधा तो थंड हवेचे ठिकाण म्हणूनच राहिले असावे,
  अंजनेरी जरी आपण अंजनेरी गावाच्या मार्गाने चढलो असलो आणि गडावर येणारे बहुतेक भाविक, ट्रेकर्स आणि पर्यटक जरी याच मार्गाने गड चढत असले तरी या प्रशस्त पसरलेल्या गडाला माथ्यावर येण्यासाठी बर्याच वाटा आहेत.अर्थात या वाटा अंजनेरी गडाच्या परिसरातील गावकरीच वापरतात.मात्र बदल म्हणून या वाटांनी अंजनेरी सर करायला हरकत नाही.
गडाचा परिसर आणि गावे
गडावर चढणार्या विवीध पायवाटा
अंजनेरीगडाचा नकाशा

यानंतर आपण जाणार आहोत अंजनेरीगावातील आणि परिसरातील मंदीरे बघण्यासाठी.मात्र त्यापुर्वी या गडदुर्गांवर भटकताना त्यांचा अभ्यास विवीध प्रकारे केला पाहिजे.जरी दुर्ग हे लष्करी ठिकाण असले तरी गिरीदुर्गांचा अभ्यास परिसरात आढळणारे प्राणी, वनस्पती या दृष्टीकोणातून देखील करता येईल. यासाठी वनविभागाने पावले उचलली आहेत. वन विभागाने संवर्धन राखीव म्हणून मान्यता दिल्यामुळे अंजनेरीवरील जवळपास ३५० हून अधिक वनस्पतींचे संवर्धन करण्याचा मार्ग सोपा झाला आहे. त्याच्या जबाबदारीसाठी अंजनेरी संवर्धन राखीव व्यवस्थापन समितीची देखील स्थापना करण्यात आली आहे. संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन आराखडा  तयार करण्यात येणार आहे.मुळात अंजनेरी परिसराची किल्ला याबरोबरच दुसरी ओळख म्हणजे दुर्मीळ वनस्पतींची. शिवाय अंजनेरीतील डोंगराच्या कडेकपारीत गिधाडांचे अस्तित्व आहे.  गिधाडांची घरटी तसेच त्यांचा आढळ असलेले हे ठिकाण लुप्त होण्याच्या स्थितीत आहे. वन विभागाच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी पर्यावरण संशोधक जुई पेठे यांनी अंजनेरीवरील वनस्पतींचा अभ्यास केला होता. या अभ्यासाच्या आधारे वन विभागाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरीतील ५.६९ चौरस किलोमीटरचे क्षेत्र संवर्धन राखीव करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला होता.



















 २०१४ मध्ये सादर झालेल्या   या प्रस्तावाला वन विभागाने मान्यता देत हे क्षेत्र संवर्धन राखीव म्हणून जाहीर केले आहे. तसेच अंजनेरी संवर्धन राखीव क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली.पेठे यांनी केलेल्या अभ्यासानुसार अंजनेरी डोंगरावर तब्बल साडेतीनशेहून अधिक वनस्पती आहेत. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाट आणि देशभरात आढळतात. ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही. ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, अशा काही वनस्पती या ठिकाणी मात्र अद्याप तग धरून आहेत. कमी मातीच्या थरात अनेक वैशिष्ठय़पूर्ण वनस्पती वाढतात. त्यात कंद, कीटकभक्षी वनस्पती आहेत. परंतु वाढत्या पर्यटनामुळे त्यांच्याही अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. या डोंगरावर भाविकांबरोबर भटकंतीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.
  या क्षेत्रातील माणसांचा मुक्त वावर वनस्पतींचे अस्तित्व नष्ट करू शकणारा ठरू शकतो, याकडे अभ्यासात लक्ष वेधण्यात आले. अंजनेरीवरील विशिष्ट भाग संवर्धन राखीव म्हणून जाहीर झाल्यामुळे नष्ट होऊ पाहणाऱ्या वनस्पती व जैवविविधतेला नवसंजीवनी मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. जैवविविधतेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या सोबतीने हे काम करावे लागेल. संवर्धन राखीव झाल्याने पुढील काही वर्षांच्या नियोजनार्थ व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येईल. पर्यटन व तत्सम बाबींवर काही नियंत्रण आणता येईल, असे या समितीतील सदस्यांनी सांगितले.
दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन दृष्टिपथात
    एखाद्या दुर्मीळ वनस्पतीचे अस्तित्व नष्ट होण्याचा धोका किती दुष्परिणाम घडवून आणू शकतो, यावर तिच्या संवर्धनाच्या कामाची निश्चिती होते. त्यासाठी ‘आययूसीएन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने मानके निश्चित केली आहेत. त्याकरिता संबंधित वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सिद्ध करावे लागते. अंजनेरी प्रकल्पात जुई यांनी त्या मानकांनुसार अभ्यास केला. परिसरातील आठ दुर्मीळ वनस्पतींना या संस्थेने आधीच त्या गटात स्थान दिले आहे. या अभ्यासामुळे ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही अतिशय दुर्मीळ वनस्पती या गटात समाविष्ट करून घेण्यात यश आले आहे. एकदा मान्यता मिळून त्या यादीत संबंधित वनस्पतीचा समावेश झाला, की तिच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निधी व अन्य मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त होतो.
        वनस्पती अभ्यासकांनी अंजनेरी पर्वतरांगेत आजवर ३८५ हून अधिक निरनिराळ्या सपुष्प वनस्पतींची नोंद केली आहे. वन विभागाच्या मदतीने अद्याप तेथे नवनव्या वनस्पती शोधण्याचे काम संशोधक करीत असतात. त्र्यंबकेश्वर महाविद्यालयामधील वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी शिवराम राऊतमाळे व किशोर भोये हे अंजनेरी येथे नियमित अभ्यासासाठी गेले असता, त्यांना नवी वनस्पती दिसली. त्यांनी तिची छायाचित्रे घेऊन ती अभ्यासक डॉ. शरद कांबळे यांना दाखवली. त्यांनी ही अतिदुर्मिळ अशी ‘फ्लेमिंगिया रोलाई’ वनस्पती असून, ती शेंगा येणाऱ्या फॅबेसी कुळातील असल्याचे सांगितले. या कुळासंदर्भातील तज्ज्ञ डॉ. संदीप गावडे यांनीही या वनस्पतीला दुजोरा दिला.जगाच्या पाठीवर ती फक्त कळसुबाई, हरिश्चंद्रगड व तोरणा किल्ला येथेच दिसून येते.वनस्पती संशोधक पटवर्धन यांनी ही वनस्पती सर्वप्रथम कळसुबाई येथे सन १९०७मध्ये शोधली होती. तिला बिल्लोरे व हेमाद्री या शास्त्रज्ञांनी सन १९८२मध्ये ‘मौघानिया रोलाई’ हे नाव दिले. नंतर तिचे नामकरण ‘फ्लेमिंगिया रोलाई’ असे करण्यात आले. अंजनेरी येथे ही वनस्पती आढळल्याने तिचे अस्तित्व नाशिकमधील अन्य पर्वतरांगांतही असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.फ्लेमिंगिया रोलाईला सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात फुले व फळे येतात. तिच्या फुलोऱ्यावर दाट केसाळ लव असते. त्यावरून ही वनस्पती चटकन ओळखता येते. 
    गिरीदुर्गांचा हा दृष्टीकोण ठेवून अभ्यास झाल्यास, असेच नवेनवे संशोधन होउ शकेल अशी आशा वाटते.
 



 
 


Jaina Tirthankara Rishabhanatha
   
 नव्याने बसवलेली ऋषभनाथांची मुर्ती
  ह्याच अंजनेरीत यादवकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेली तब्बल १६ मंदिरे विखुरलेली आहेत. यातली बहुसंख्य मंदिरे ही जैन असून उर्वरित ४ हिंदू मंदिरे आहेत. आज ही सर्वच मंदिरे बहुतांशी भग्नावस्थेत आहेत.
    ही सगळी मंदिरे यादवकालीन. साधारण ११ व्या, १२ व्या शतकात ही बांधली गेली तेव्हा देवगिरीचे यादव हे सार्वभौम नव्हते. ते कधी राष्ट्रकूट तर कधी चालुक्यांचे महाअमात्य होते. तेव्हा यादवांची राजधानी नाशिकजवळचे सिंदिनेर अर्थात सिन्नर ही होती. तर अंजनेरी येथे यादवांचीच एक शाखा अधिष्ठित होती. सेऊणचंद्र यादव (तिसरा) जो यादवांचा एक महासामंत असावा हा मुख्य यादवांपैकी नाही कारण हेमाद्रीचे राजप्रशस्तीत किंवा यादवांचे इतर लेखांतही ह्याचा उल्लेख आढळत नाही. ह्या सेऊणचंद्राचा एक शिलालेख मात्र इकडे आहे. यादवांची इकडील शाखा जैन धर्माचे पालन करत असावी किंवा ह्यांच्या घरामधील एक महाल जैन घराण्यातील असावा त्यामुळे इथे जैन मंदिरांची संख्या जास्त आहे.
इथे नागर, फांसना आणि भूमिज अशा विभिन्न शैलीची मंदिरे आहेत. त्यामुळे मंदिरशैलीचा अभ्यास करणार्‍यांना इथे पर्वणीच आहे.
प्रसिद्ध ब्रिटिश संशोधक हेन्री कसिन्स यांच्या (Henry cousins- Medieval Temples of Dakhan) ह्या पुस्तकांत ह्या मंदिरांविषयीचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.
The village of Anjaneri picturesquely situated on the eastern slope of the northern spur of Anjaneri or Anjaneri hill, about fourteen miles west of Nashik. Just below the village, in the plain, scattered over an area about half a square mile, there have been innumerable small shrines, of which sixteen now stand in whole or in part, while rest are represented by mounds upon which lie heap of their material- columns, images,beams, and other carved stones. The most striking feature about these remains is that they all appear to have built upon a small scale, and they are independent temples and not satellites to a larger one. They all seem to rest upon a brick foundations, and have been dedicated to various deities, the most important being Jaina, Two Vaishnava and the rest Shiva. They face all four points of the compass.
           अंजनेरीत गावातून आत गेलो कि कच्च्या रस्ता लागतो, लगेचच एक डावीकडे लहानसे मंदिर दिसते. 
नागर शैलीत बांधलेले हे लहानसे मंदिर. ह्याला सभामंडप नसून मुखमंडप आहे. जो दोन नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे. प्रवेशद्वारातील नकसदार चौकट आहे. द्वारपट्टीकेवरील गोमटेश्वर आदी जैन प्रतिमांवरुन हे मंदिर जैन आहे हे अगदी सहजच ओळखू येते. गर्भगृह मूर्तीरहित आहे.
a
 मंदिराचा दर्शनी भाग
a
नागर शैलीतील शिखर

मुखमंडपातील उजवीकडच्या स्तंभाच्या जंघेखालती एक देवनागरी शिलालेख आहे. "रवंळरनाथ जोगी". हा बहुधा एखादा जैन योगी असावा.

a

देवनागरी शिलालेख
a

 द्वारपट्टीकेवरील जैन मूर्ती

a

जळमटांमध्ये विखुरलेल्या गोमटेश्वर प्रतिमा
a

प्रवेशद्वारांवरील प्रतिहारी

   हे मंदिर पाहून थोडे पुढे जाऊन सरळ गेल्यास दोन हिंदू मंदिरे तर डावीकडे वळल्यास ३ मंदिरे आणि २ मठांचे एक संकुल दृष्टीस पडते तर संकुलाच्या समोरच अजून एक भग्न मंदिर आहे.
सर्वप्रथम हे मंदिरसंकुल पाहूयात.
    तीन मंदिरे व दोन मठांचे असे हे जैन संकुल पैकी एका मंदिरात सेऊणचंद्र यादव (तृतीय) ह्याचा स्पष्ट असा देवनागरी भाषेतील शिलालेख. संकुल बहुतांशी भग्नावस्थेत असून वीरगळ, मूर्ती, मंदिराचे तुटलेले स्तंभ्, आमलक असे जागोजागी विखुरलेले आहेत.
a
 मंदिरसंकुल
a
मंदिरसकुल पाठीमागच्या बाजूने
 संकुलाच्या प्रवेशद्वारातून आत येताच अवशेषांमधून वाट काढत काढतच आपले मंदिर दर्शन सुरु होते. डावीकडच्या मठात कित्येक मूर्ती तशाच ठेवलेल्या आहेत. मग त्यात कधी गणपती दिसतो, कधी महावीर, कधी सरस्वती, कधी यक्ष, कधी वीरगळ तर कधी इतर जैन देवता.
a
मठात विखुरलेल्या मूर्ती -गणपती
a
मठात विखुरलेल्या मूर्ती

 मठात विखुरलेल्या मूर्ती- महावीर

a

मठात विखुरलेल्या मूर्ती- हिंदू देवता

 ह्या मठासमोरच कित्येक वीरगळ हारीने मांडून ठेवलेले आहेत आणि ह्यातले काही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

a

काही वीरगळ
a

काही वीरगळ
a

 ह्या वीरगळाचे खालचे बाजूच्या चौकटीत एक सैनिक दुसर्‍या सैनिकाचे केस धरुन त्याला ओढताना दाखवला आहे.
a

तर ह्या वीरगळात दोन वीर धराशायी झालेले दिसत आहेत.


     ह्या इथेच अजून एक आगळावेगळी शिळा आहे. प्रथमदर्शनी तो वीरगळ वाटत असला तो वीरगळ नाही. ती आहे चौमुखी. जैन धर्मात संम्लेखन व्रताला फार महत्व आहे. स्व ओळखणे. अर्थात स्वतःच्या आत्म्याला शारीरबंंधनातून मुक्त करणे. म्हणाजेच उपोषण करुन प्राणत्याग करणे. साधकाच्या ह्या व्रताच्या स्मरणार्थ येथे अशा प्रकारची एक शिळा कोरलेली आहे.
     ह्यात दोन चौकटी असून वरच्या चौकटीत भगवान महावीर आहेत तर खालचे चौकटीत जैन साधक अन्नपाण्याचा त्याग करुन व्रताचे पालन करताना दाखवला आहे. साधकाचे खालचे बाजूस पूर्णपणे खराब झालेला असा अतिशय अस्पष्टसा शिलालेख आहे.
a
वीरगळ (डावीकडे) आणि चौमुखी(उजवीकडे)
a
चौमुखी (जवळून)

a

ह्याचबरोबर मंदिराचे मागचे बाजूसही अनेक भग्न मूर्ती ओळीने मांडून ठेवल्या आहेत.

     इथल्या मंदिरांना सभामंडप दिसत नाहीत. ती जागा येथे मुखमंडपांनी व्य्यापली आहे. ह्या संकुलातील तिन्ही मंदिरे जवळपास सारखीच आहे. नक्षीदार स्तंभ, प्रवेशद्वाराची चौकट, द्वारपट्टिकेवरील जैन तीर्थकर, देवतांच्या मूर्ती. आणि सर्वच गाभार्‍यांमध्ये आज मूर्ती नाहीत.

a

मंदिराचा दर्शनी भाग

a

द्वारपट्टीकेवरील भगवान पार्श्वनाथांची मूर्ती. मस्तकाभोवतीचा नाग हा धरणेंद्र यक्ष आहे.
a

गाभार्‍यात दगडी पीठासन आहे मात्र रिकामेच

दुसरे मध्यभागातील मंदिर सर्वात मोठे आहे. ह्यात सभामंडपही असून द्वारपट्टीकेवर पार्श्वनाथांची आणि जैन देवतांच्या मूर्ती आहेत. सभामंडपात एका भिंतीत सेऊणचंद्र (तृतीय) ह्याचा भलामोठा शिलालेख असून तिथेच जवळाच सरस्वतीचीदेखील मूर्ती आहे.

a

द्वारपट्टीका
a

सभामंडप
a

सभामंडपाचे कमळाच्या आकृतीसारखे नक्षीदार छत

सेऊणचंद्राचा शिलालेख

मंदिराच्या सभामंडपातील एका भिंतीत सेऊणचंद्र (तिसरा) ह्याचा शिलालेख आता आपण पाहूयात.

शिलालेखाची सुरुवात

ओ पंच परमेष्ठिभ्यो नमः | स्वस्ति श्री शक संवत १०६३ दुदुंभिनाम संवत्सरांतग्गत ज्येष्ठ सुदि पंचदश्यां सोमे अनु
राधानक्षत्रे सिद्धियोगे अस्यां संवत्सरमासप़षदिवसपूर्व्वायां तिथौ समाधिगताशेषपंचशब्द....

अशी होऊन शेवट

...श्रीकोलेश्वरपण्डितसुतेन दुष्टगणकगजकंठीरवेण साधुगणकचरणावृंद मकरंदलुब्धषट्पदेन श्री दिवाकरपण्डितेन हट्टशासनं सै शैलपट्टे लिखिटमितिं...मंगल महाश्री|

अशी होते.

शिलालेखाची सुरुवात "ओ पंच परमेष्ठिभ्यो नमः" म्हणजे अर्हत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू ह्या पाच परमश्रेष्ठींना वंदन करुन होते.
     ह्या शिलालेखात सेऊणचंद्र आणि त्याचा अमात्य पाणुमडऊरी यांची प्रशस्ती गायली असून शके १०६३ साली ह्या दोघांनी विचारविनिमय करून दोन हाटगृहे (दुकाने) श्री चंद्रप्रभ स्वामी (८वे जैन तीर्थंकर) ह्यांचे मंदिरासाठी करमुक्त करुन दान केली. लाहड साधुम वत्सराज साधू व दशरथ सांधू यांनी पण श्री चंद्रप्रभ तीर्थंकर व य्थील एक शिवालयास दान केले (चंद्रप्रभाय देवाय कंदर्पदहनाय च) व हे शासन कोलेश्वर पंडिताचा पुत्र दिवाकर पंडित ह्याने एका शिळेच्या पट्टावर अंंकित केले.

                ह्या सेऊणचंद्राचा उल्लेख हेमाद्रीचे राजप्रशस्तीत किंवा यादवांचे मुख्य शाखेच्या इतर कुठल्याही शिलालेखांतील अथवा ताम्रपटातील वंशावळीतील नाही. मात्र त्याचवेळी हा सेऊणचंद्र स्वतःला ह्या शिलालेखाद्वारे द्वारावतीपुरपरमेश्वर, विष्णुवंशोद्भव, यादवकुलकमलिका, विकासभास्कर, यादवनारायण अशी बिरुदे धारण करतो. ह्याचाच अर्थ तो मूळ यादवांपासून विभक्त होऊन अंजनेरीत स्थलांतरीत झालेल्या यादवांच्या एका शाखेपैकी असावा.

२७. सेऊणचंद्र (तृतीय ) ह्याचा हा शिलालेख
a

इथले तिसरे मंदिर जवळपास निम्मेअधिक जमिनीत गाडले गेले आहे. रचना किंचित वेगळी आहे.

a

संकुलातील तिसरे मंदिर
a

 संकुलातील पडझड
a

संकुलातील पडझड

संकुलातून बाहेर आल्यावर समोरील बाजूस असेच एक नागर शैलीतील लहानसे मंदिर आहे. शैली आधीच्या मंदिरांसारखीच

a

अजून एक भग्न मंदिर
a

नागर शैलीतील जैन मंदिर दर्शनी भाग (पाठीमागे अंजनेरी नवरा सुळका)


ह्यांनंतर येतात ती एकाशेजारी एक असणारी हिंदू मंदिरे. ही वैष्णव मंदिरे असून ही जैन मंदिरांनंतर (साधारण बारावे शतक) बांधली गेली असावीत. ह्यांचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.

a

पडझड झालेले मंदिर

   हे मंदिर भूमिज शैलीतील आहे. मंदिराच्या पार्श्वभागी वर वर चढत जाणारे मजले अगदी स्पष्टपणे दिसतात.

a

भूमिज शैलीतील शिखर

मंदिराच्या बाह्यभिंतींवर त्रिविक्रम विष्णू (वामनावतार), विदारण नरसिंह आणि पूर्णरुपातील विष्णू अशा प्रतिमा कोरलेल्या आहेत.

a

त्रिविक्रम विष्णू
a

विदारण नरसिंह
a

विदारण नरसिंहाचीच अजून एक मूर्ती
a

विष्णू

द्वारपट्टीकेवर लक्ष्मी अधिष्ठित असून गाभार्‍यातही पूर्वी भिंतींवर असलेल्या नृसिंहाचीच मूर्ती सध्या आणून ठेवलेली दिसते.

a

द्वारपट्टीका
a

प्रवेशद्वारावरील चौकट व गाभार्‍यातील पीठासनाचे खालचे बाजूस असलेला गरुड

ह्याचे शेजारचे मंदिर जवळपास संपूर्ण भग्न झालेले असून द्वारचौकटींशिवाय काहीही शिल्लक नाही.

a

पूर्ण भग्नावस्थेतील शेजारचे मंदिर
a

शिल्लक राहिलेली द्वारचौकट. मध्यभागी लक्ष्मी अआणि शेजारी गणेश
a

भग्न मंदिर
a

भग्नावस्थेतील मंदिर व त्याशेजारील अंजनेरी नवरा सुळका

   

* सेऊणचंद्र तृतीय ह्याचे विषयीची माहिती व शिलालेखातील वाचन याकरिता डॉ. ब्रह्मानंद देशपांडे लिखित 'देवगिरीचे यादव' ह्या पुस्तकातून संदर्भ घेतलेले आहेत.

 
 
 शिखरांच्या भूमिज आणि नागर या २ प्रकारांबद्दल जरा विस्कटून सांग ना. नक्की फरक कसा केला जातो यामध्ये इ. इ.


 




पडझड झालेल्या मंदिरांचे अवशेषही आपल्याला त्या सुवर्णयुगाचे व आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतात. जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला प्रत्येक अन प्रत्येक दगड शिल्पांनी कोरलेला आहे. त्यावर कोरलेले संदेश, आकृत्या, देवांच्या मुद्रा केवळ अन केवळ थक्क करून सोडतात. एकाही दगड प्लेन व न कोरीवकाम केलेला दिसणार नाही. 
मुक्तहस्ते स्थापत्यकलेचे पाठ घालून देणारी ही देवालये पाहून खरच भुलून जायला होते. आत्ता या-क्षणी या भग्न देवालयाच्या साक्षीने आपण या गौरवशाली स्थापत्यकलेच्या प्रेमात पडत आहोत असे वाटायला लागते.

……आणी बुद्धही थिजला !!

अंजनेरी येथील विष्णू मंदिर

 अंजनेरी येथील मंदिर समूहातील क्रमांक आठ चे हे मंदिर या मंदिर समूहातील इतर मंदिरांच्या धाटणीपेक्षा काहीसे निराळे आणि म्हणूनच अपवादात्मक आहे. या भागातील बहुतेक मंदिरावर नागर शिखरे आहेत. इंजिनरीच्या या मंदिर समूहात फासना प्रकारचे शिखर असलेले एक मंदिर आहे या मंदिरासमूहातील विष्णू मंदिराचे शिखर भूमीस प्रकारचे आहे.
  मंदिर पश्चिमाभिमुख आहे या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा हेनरी कजिन्सने या मंदिराची पाहणी केली त्या वेळीच हे मंदिर अत्यंत वाईट अवस्थेत होते. मंदिराचे शिखर आणि मंदिराचे उंच जोते या दोन्ही घटकांची बऱ्यापैकी पडझड झाली होती आणि मंदिरावर झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. आज मंदिरावरील झाडे झुडपे काढून टाकण्यात आलेली असली तरीही मंदिराची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही मंदिर उंच जगती वर उभे असून मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलावण्यास आहे. या मंदिरास कदाचित मुख्य मंडपी असावा परंतु मंडपाचा भाग पडून गेला असल्याने जमिनीवरील भिंतीच्या अवशेषावरूनच त्याची कल्पना करावी लागते. शिखरावरील शिल्लक असलेल्या तीन जता आणि त्यावरील चैत्य गवाक्षांची नक्षी यावरून भूमीश प्रकारचे असावे असे दिसते. दोन लता असलेल्या छोट्या शिखर प्रतिकृतींच्या रांगा शृंगार आज पडून गेलेल्या आहेत. पण मंदिराच्या पडझडीच्या अवशेषांचे जे ढिगारे मंदिराभोवती आहेत त्यात या शिखरा प्रतिकृती दिसून येतात. आज या मंदिराच्या शिखराचे चांगलीच पडझड झाली असल्याने या शिखरावर प्रतीकात्मकरीत्या किती भूमी अथवा मजले दाखविण्यात आले होते हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. तथापि हे शिखर पंच भूम भूमीच प्रसादाचे असावे असा अंदाज करता येतो
  गर्भगृहाचा तलविण्यास पंचरत आहे. गर्भगृहाच्या दक्षिणेकडे भद्रावर नरसिंहाची पूर्वेकडील भद्रावर वराहाची आणि उत्तरेकडील भद्रावर वामनाची मूर्ती आहे. या मूर्ती सोडल्या तर गर्भगृहाच्या बाह्य अंगावर कोणतेही अलंकार नाही. तथापि पिठाच्या कुंभ थरावर छोट्या देवळांची लघु मंदिरांची नक्षी आहे मात्र मंदिरामध्ये कोणतीही आकृती शिल्पे नाहीत याप्रमाणे अंग भागाच्या म्हणजे बायांगावर पुढे आलेल्या स्तंभाच्या गंगाभागावर कोणतीही आकृती शिल्पे नाही. म्हणून शिल्प शास्त्राच्या भाषेत या जनतेला नागरजंगा अथवा शुद्ध जंग हा म्हणता येईल.
    पिठाच्या वरच्या भागातील उत्सेघात्मक थर पुढील प्रमाणे आहेत  मिट्ट जाड कुंभ आणि कणी यावर कुंभ कलश कपोत आली आणि वंचिका. भद्रावरील जंगला भाग वगळता तर बाकीच्या जंगला भागावर कोणतीही आकृती शिल्पे नाहीत. त्यावर भरणे शिरावटी कपोताली आणि छाती आहे.
  अंतराळाला अंडाकृती छत असून त्याच्या मागच्या भिंतीत गर्भगृहाचे द्वार आहे. ह्या द्वारावरील ललाटबिंबावर विष्णू कोरलेला असून त्याच्या एका बाजूस ब्रह्मदेव आणि दुसऱ्या बाजूस शिव कोरलेला आहे. मला भिमाच्या खालच्या भागावर जिथे बहुदा गणेश कोरलेला असतो तेथील मूर्ती तुटलेली आहे ही कोरलेली मूर्ती गरुडाची असावी असे कधीच याला वाटते.
  या विष्णू मंदिराचे याच मंदिर संकुलातील जैन मंदिरांशी वास्तुशास्त्रीय दृष्ट्या अथवा शिल्प दृष्ट्या असलेले साधर्म्य लक्षात घेता हे मंदिर इसवी सनाच्या 11 व्या शतकाच्या अखेरीस किंवा बाराव्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले असावे
 
अंजनेरी येथील जैन मंदिर
      नाशिक त्रंबकेश्वर मार्गावर नाशिक पासून३५ कि.मी. अंतरावरील अंजनेरी गावाजवळ १६ मंदिरांचा समूह आणि त्याच काळात बांधलेली पण आज अत्यंत वाईट अवस्थेत असलेली पुष्करणी आहे. या मंदिरांपैकी चार मंदिरे हिंदूंची आहेत आणि उरलेली जैन मंदिर आहेत. या विविध मंदिरांना भूषवणाऱ्या शिखर प्रकारांमुळे हा मंदिरासमूह उल्लेखनीय बनला आहे. या ठिकाणी नागर, भूमीज आणि फासनाकार असे तीन शिखर प्रकार आढळतात. ही सर्व मंदिरे सर्वसाधारणपणे मध्यम आकाराचे असली तरी ती काही शतकांमध्ये बांधली गेली असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी सापडलेल्या महासामंत सेउनचंद्र ( इ.स. ११२०- इ.स. ११४५ ) यादवांच्या शिलालेखांमुळे या मंदिराचा काळ ठरवणे सुलभ झाले आहे. तीर्थंकर चंद्रप्रभ मंदिराच्या व्यवस्थेसाठी घरे आणि दुकाने दान केल्याचे या शिलालेखात नमूद केले आहे. शिलालेखावरून या ठिकाणी असलेले मंदिरे इसवी सणाच्या अकराव्या आणि बाराव्या शतकात बांधली गेली असले असे दिसते. या मंदिर समूहाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांपैकी तीन मंदिरे आणि दोन मठ जवळ जवळ असून या पाच वास्तुभोवती एकच सीमा भिंत आहे. उल्लेखित तीनही मंदिर नागर प्रकारचे असून त्यांचा तलविण्यास पंचरथ प्रकारचा आहे. त्यांच्या तलविण्यासात आडवा लांबट मुखमंडप, तेवढ्याच रुंदीचा चौरस मंडप, अंतराळ आणि गर्भगृह याचा समावेश होतो. गर्भगृह आणि मंडप यांच्या आकार वेगवेगळे असले तरी या दोन्हीचा तलविण्यास मात्र पंचरथ आहे. या ठिकाणी असलेल्या इतर मंदिरांशी विशेषता वैष्णव आणि शैव मंदिरांशी फारकत घेणारे या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या मुखमंडपाची रुंदी मंडपाची रुंदी इतकीच आहे. याउलट इतर मंदिरांच्या मुखमंडपाची रुंदी मंडपापेक्षा बरीच कमी असून यांनी अर्धमंडप या संज्ञेला सार्थकता आणली आहे. सध्या ज्यांचे विवेचन सुरू आहे त्यातील नागर मंदिरांचे मुखमंडप दोन स्तंभ आणि दोन अर्धस्तंभ यावर उभे आहेत. ते मंडपाच्या रुंदी इतकेच रुंद आहेत गर्भगृहावरील शिखरावर कोणतेही अलंकरण नाही. मध्यभागी मूलमंजिरी आणि चार बाजूंच्या चार कोपऱ्यावर मुलंमंदिराच्या प्रतिकृती आहेत. म्हणूनच हि नागर मंदिरे पंचण्डक ( पंच + अंडक ) प्रकारची आहेत. गर्भगृहावरील अंगे आणि प्रत्यांगे मुलमंजिरी वरील आमलकाखाली एकत्र आले आहेत. आम्लकावर शिखर शीर्ष आहे.
 हेन्री कझेनस याने लिहीलेल्या 'मेडिव्हियल टेंपल्स ऑफ डेक्कन' या ग्रंथांमध्ये ( प्लेट नंबर ५९ ) अशा प्रकारच्या नागर मंदिराचे छायाचित्र आहे. या मंदिराला मूलमंजिरी व्यतिरिक्त चार कोपऱ्यावर चार छोटी नागर शिखरे आहेत. या शिखरावर निरनिराळ्या प्रकाराचे कळस आहेत. मात्र या मंदिराच्या मंडपावर फासनाकार शिखर आहे. 

Temples of Anjaneri, Nashik, Maharashtra

Pancha Digambar Temple Complex, Anjaneri
Pancha Digambar Temple Complex, Anjaneri

I was all set to descend the hill of Anjaneri after resting for a while at the Anjani Mata temple.  The experience uphill was exhilarating and I was fully charged up. However during my descent a group of temples situated a little distance away from the village of Anjaneri caught my attention. Hence, I decided to explore these temples of Anjaneri on reaching the base, completely forgetting about the caves that I wished to explore around the lakes. There are a few cave temples and an ashram besides a lake on the rear side of the first temple. As I continued my descent and reached the trek base, I immediately ordered a plate of special Maggi noodles at a hotel owned by an elderly person. I was extremely hungry and gulped down 2 full plates of noodles. My legs were tired and I started to have second thoughts about exploring the temple complexes near the village by foot. The temple complex was located at a distance of at least 2 km from the trek base. In the meanwhile, a bunch of boys who returned to their vehicle after completing the trek offered to drop me off till the cross-road and I happily welcomed their offer.
Hot Maggi
 After thanking them, I walked across the village of Anjaneri where I could sight the ruins of many temples spread here and there. I reached a spot where I found 3 Hero stones / Sati stones. Here on, I visited the first temple complex which was in ruins. It housed a big temple of Lord Vishnu along with another smaller temple dedicated to Goddess Lakshmi.  The temples remain mostly damaged, with some restoration work being undertaken currently by the ASI. The grandeur of this temple can be felt even in its ruins. It is disheartening to witness the state of this temple today. The main temple is built as per the ‘saptharatha plan’ and houses a damaged yet beautiful panchabhuma bhumija shikhara’, which can be classified under the ‘Hemadpanti/Hemadpanthi Style of Architecture’Hemadpant was a celebrated physician of the Dwaparayuga, who cured Vibhishana, the brother of Ravana, King of Lanka.  In return, he begged the services of some giant architects with whose help he built numerous temples and step wells in western India, and these styles were collectively classified as ‘Hemadpanti Style of Architecture’. Historically, Hemadri or Hemadpant was a minister of the 9th Devagiri Yadava King Ramachandra (1271 -1308 CE), who was also a great writer and went on to build numerous temples in this region in Hemadpanthi Style of Architecture. There are carvings of Lord Vishnu’s incarnations on the outer walls of this temple. The door frame of the garbhagriha is of Chausakha with beautiful carvings of Trimurti (Lords Brahma, Vishnu and Maheshwara) along with Lord Ganesha and Goddess Lakshmi on the lintel. The garbhagriha houses a damaged murti of Lord Vishnu on a Garuda peetha. The Lakshmi temple however is much worse than the main temple and devoid of any murti.
Goddess Lakshmi Devi Temple
Lord Vishnu Mandir
Chausakha Door Frame
Lord Brahma, Vishnu & Shiva Carved on the Lintel
Rubble of Lord Vishnu Temple
Right opposite to this temple is a temple dedicated to the Jaina Tirthankara Rishabhanatha (Adinatha) which is in complete ruins.  What a sad and disturbing sight it was! The temple parts were seen spread across the area inside the fence built by the ASI, reflecting the sheer carelessness in maintaining and preserving our heritage. The murti of Lord Rishabhanatha is kept under the open sky without any shelter. From here, I moved on to the next and the biggest temple complex called as the Pancha Digambar Temple. The main temple here has been converted, currently being dedicated to Lord Shiva. This conversion may have happened in the later centuries, as a part of an effort in its restoration. Thus the main temple here is in a better shape, although not good. The ASI however is continuously and constantly working towards the temple’s repair. There are 4 small temples in this complex apart from the main temple and an open air ASI Museum, where all the artifacts found in this area are preserved. The last temple here was a small yet beautiful Jaina temple situated about a few meters away from this temple complex. This temple houses a murti of Jaina Tirthankara. All the temples here were built during the reign of the Devagiri Yadavas between 11th and 13th centuries. Thus ending my quest for this place, only ask was to walk to the main road and board a bus back to Nashik
Main Temple of Pancha Digambar Temple Complex
Inscribed Stone
Restoration Work in Progress
Jain Temple


Reference:
1. Maharashtra district Gazetteer - Nashik 
https://www.teamgsquare.com/2019/11/temples-of-anjaneri-nashik-maharashtra.html


  या प्राचीन  मंदीराबरोबरच एक आधुनिक मंदीराच्या रुपात एक नवीन आकर्षण या अंजनेरी परिसरात निर्माण झाले आहे, ते म्हणजे प्रतिकेदारनाथ उर्फ श्री स्वरुपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर.
उत्तराखंड मधील केदारनाथला दर्शनाला जाण्यासाठी सर्वच भाविकांना शक्य होत नाही. शेकडो मैल केदारनाथ मंदिर दूर आहे. त्यामुळे भाविकांना येथेच दर्शन मिळावं. या उद्देशाने मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. वाढोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरुपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर हे पुणे (Pune) येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे.  प्रतिकेदारनाथ मंदिर म्हणून प्रचार प्रसार हा भाविकांनीच केला आहे. दररोज शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. या मंदिराचे कामकाज २०१४ साली पूर्ण झाले आणि तेव्हा पासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.  मात्र, तेव्हा मंदिराचा फार प्रचार प्रसार झाला नव्हता अनेकांना मंदिर माहित नव्हत. पण 2022 च्या सुरुवातीलाच मंदिराचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रतिकेदारनाथ मंदिर नावाने प्रचंड व्हायरल झाले. तेव्हापासून परिसरात प्रथमच असे मंदिर असल्याने शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.अंजनेरी पर्वत रांगेत चार एकरच्या जागेत हे मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिर परिसरात भक्त निवास, भागवत पूज्यपाद, शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्वरी मंदिर आहे. सामान्य नागरिकांमध्ये आध्यात्मविद्येचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे मंदिर स्थापन करण्यात आले आहे.मंदिरात जाण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना वाढोली फाटा आहे. त्या फाट्यावरून डाव्या हाताला टर्न घेतल्यानंतर 3 किलोमीटर अंतरावर वाढोली गावं आहे. गावातून पुढे मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. तसेच अंजनेरी फाट्यावरून देखील मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. नाशिक शहर ते प्रतिकेदारनाथ मंदिर हे अंतर साधारण 30 किलोमीटर आहे. खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही जाऊ शकता.

संदर्भ :-

१) नाशिक जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
३) डोंगरयात्रा -आनंद पाळंदे
४) दुर्गभ्रमंती नाशिक जिल्ह्याची - अमित बोरोले
५) शोध शिवछ्त्रपतीच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
६) http://www.maayboli.com,   या वेबसाईट
७)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
८)  www.durgbharari.in  हि वेबसाईट
९)  https://www.lokmat.com, https://www.loksatta.com, https://www.msn.com, http://rajukisanmisal.blogspot.com, https://trekadventure365.blogspot.com, https://www.teamgsquare.com/  या वेबसाईट


जिल्हा : नाशिक

उंची : ३२१५ फुट


 


भूमी म्हणजे मजला.
भूमिज शैलीत मंदिराच्या शिखरभागात मूळ शिखराची प्रतीकृती असलेली लहान लहान लघुशिखरे एकेक मजल्यांसारखी वर वर चढत गेलेली आढळतात. त्या भागास कूटस्तंभावली असे म्हणतात. भूमीज शिखरांत शिखराचा खालचा भाग आणि आमलक ह्यांना जोडणारी सलग अशी एक पट्टी बाजूंना असते. हेमाडपंती शैली ही भूमिज शैलीच. हेमाद्रीच्याही कितीतरी आधीपासून ही शैली प्रचलित होती. महाराष्ट्र, कर्णाटक आणि गुजराथेत भूमिज मंदिरे बरीच आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर हे महाराष्ट्रातील पहिले भूमिज मंदिर मानले जाते.

तर नागर शैली म्हणजे एक उंच शिखर आणि त्याचे खालचे बाजूला थोड्या कमी उंचीची शिखरे अर्थात शृंग आणि उपशृंग. मध्य प्रदेश, उत्तर भारतातील मंदिरे नागर शैलीतील आहेत. नागर शैलीत शिखरांवर बहुधा आमलक असतोच. महाराष्ट्रात पेशवेकाळात बांधली गेलेली म्हणजे त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, नाशिकचे काळाराम मंदिर ही नागर शैलीतील. उभट शिखरांमुळे ही मंदिरे उंच भासतात.

भूमीज शैली.
रतनवाडीचा अमृतेश्वर - भूमीज शैली.
a

सिन्नरचा गोंदेश्वर - भूमीज शैली.
a

कायगाव टोके मंदिर- नागर शैली
a

भीमाशंकर - नागर शैली.
a

 निर्मिती केली. दंडकारण्य परीसर म्हणजे आजचा अंजनेरी- त्रिंबक परिसर. गावातील बुजुर्ग लोकांनी ही रामायणकालीन असल्याचेच सांगितले.

तर काही ठिकाणी ही मंदिरे ११व्या शतकातील आहेत असा उल्लेख सापडला. 
प्रत्यक्ष बघता, या मंदिरांचे बांधकाम हे हेमांडपंथी रचने नुसार झालेले दिसले. की जी शैली इ.स. १५०० काळाच्या सुमारास उदयास आली.

असो, खरा इतिहास शोधायला पाहिजे आणि ते होईल तेव्हा होईल पण सध्या ह्या प्राचीन मंदिरांचे अवशेष बघून त्याकाळची स्थापत्यकला किती प्रगत होती याचा साक्षात्कार मात्र होतो.

सर्व मंदिरांची पडझड झालेली आहे. काही मंदिरे तर इथे पूर्वी एक मंदिर असावे असा संशय यावा इतकीच उरली आहेत. आपल्याकडे किती प्राचीन ठेवा आहे आणी तो जपला पाहिजे याची तिळमात्र जाणीव नसलेल्या भारत सरकार वा इतिहास संशोधक मंडळ वा तत्सम जो कोणी जबाबदार व्यक्ती व संस्था व रचना असेल त्याची कीवच करावी वाटते. 
त्यासाठी एकाच ओळ समर्पक आहे. 
" बुद्धी ज्याची दीन …… वृत्ती ज्याची हीन …… राग अश्याचा करावा …… कशापायी ……… !!!"

असो, 
हेमांडपंथी स्थापत्य शैली चे वैशिष्ट्य असे की, पूर्ण मंदिराची रचना ही एकाच दगडात कोरून केलेली असली तरी आवश्यक तेथे joint देताना दगडाची खोबण करून, एकात एक दगड गुंफून केलेली असते. त्यामुळे त्या शैलीतील मंदिरांमध्ये एक लेयर टाईप स्ट्रक्चर येते. आणी महत्वाचे हे की. एकात एक गुंफून केलेल्या मांडणीमुळे उभ्या दगडालाही जास्तीत जास्त आधार मिळतो आणी वर्षानुवर्षे वस्तू अभेद्य राहते. या शैलीतील बरीच मंदिरे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. यांची कोणत्याही कारणाने (नैसर्गिक व इतर) पडझड झाली तरी पूर्ण वास्तू कधीच पडत नाही. 

जवळचे पर्यटन स्थळ    
  ● अंजनेरी मंदिरे आणि किल्ला  (६.. १ कि.मी.
  ● त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर (९. १ कि.मी.)
  ● वाईन चवीची ठिकाणे- सुला द्राक्षबाग (१६. २ कि.मी.).
  ● हरिहर चा किल्ला २१. १ कि.मी.)
  ● पांडवलेणी (२३. ९ कि.मी.). 
  ● भास्करगड किल्ला (२७. ५ ​कि.मी.) 



भेट देण्याचा नियम आणि वेळ, भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

संग्रहालय अंजनेरी टेकड्यांनी वेढलेले आहे आणि प्रत्येक हंगामात भेट देता येते.


 https://lokmat.news18.com/maharashtra/nashik/history-of-prati-kedarnath-temple-in-nashik-disdrict-750014.html

 

Anjaneri is a Tirtha Kshetra located at a distance of around 20km from Nashik city. History of Maharashtra cannot be completed without mention of Jainism and Monarchs who were ardent follower or patrons of Jainism.

Archaeological heritage and inscriptions found from this place. The place has its connection to Seuna or Yadava of Devgiri in medieval period of Indian history.

Jain temples in the vicinity of Anjaneri village has an inscription of Yadava or Seuna Monarch Seunadeva. He is represented to have made an endowment to Chandraprabhu Jain temple at Anjaneri in Saka Year 1063 or 1141 AD. The endowment was done of two shops for maintenance and daily expenditure of Jain temple.


The Jain cave cut on the Anjaneri Mountain has no definite time of its construction as lack of inscription and some other sources. But one thing is lucid is that this cave should be hailed from Rashtrakoota era of Medieval Indian history.



The Seunadeva was described in the inscription as Mahasamanta but according to scholars and historians there were only two Seuna from Yadav clan who were Jain devotee. Moreover the later Seuna who was an ally of Chalukya king Vikramaditya II existed between 10-11th century AD. The inscription is of later period and Seunadev mentioned in the epigraph must be another one.

The Seunadev mentioned in the inscription was a monarch of a minor branch of Seunas or Yadavas of Devgiri. According to some scholars Anjaneri was once a capital of Yadavas who were initially chieftains of Kalyan Chalukya and after that they ruled independently in Maharashtra region.

It is said that the region of Anjaneri had 108 temples of Jaina creed. So we can imagine how a mass population was inhabitant here and the place was a great center of Jainism in the past.

Jain devotee and enthusiasts should visit the place along with other Jain centers like Chamar Jain Caves(Gajpantha) and Pandav Jain Caves nearby.

The sorrowful part of visit to the Jain cave temple is that the cave is converted into a Shiva temple and appropriated by local Hindus. Archaeological department and Jain community should be aware to preserve our ancient Jain heritage.



 

 

 







 

 

 त्र्यंबकेश्वर मार्गावर असणार्‍या अंजनेरीपर्यंत पोचणे अगदी सोपे आहे. सीबीएस (ठक्कर)हून सतत एसटी मिळतात. अंजनेरी गड म्हणजेच रामायणामधील सुप्रसिद्ध ऋष्यमूक पर्वत. हनुमानाचा जन्म याच गडावरचा. अंजनीमातेच्या नावावरून या गडाचे नाव अंजनेरी पडले असावे. वनवासामध्ये रामचंद्रांनी बराचसा काळ पंचवटी परिसरात घालवला असल्यामुळे नाशिकच्या आसपास अनेक रामायणकालीन स्थळे आहेत. खुद्द अंजनेरी गावातही पुराणकालीन अनेक उद्ध्वस्त मंदिरे आहेत.

अंजनेरीला जाण्यासाठी सर्वात योग्य ऋतू म्हणजे पावसाळा. मुळात हा गड सोपा असल्यामुळे पावसाळ्यातही जाता येऊ शकते. सोबतीला धबधबे असतातच. अंजनेरी गडापर्यंत पोहोचण्याचे साधारण तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यापर्यंत गाडी जाऊ शकते. तिथून पठारावरील अंजनीमातेच्या मंदिरापर्यंत पायर्‍या आहेत. तिथून तिसर्‍या टप्प्यात गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. एकूण भटकंती सोपीच आहे.
अंजनेरी गावात उतरलो, तेव्हा पावणेसात वाजले होते. अंजनेरी करून बारा पर्यंत खाली उतरायचे ठरवले होते. नंतर वेळ आणि ताकद असेल तर ब्रह्मगिरीही करून यावा असा प्लॅन होता. गावात शिरताना हे मंदिर लागले. अनायासे शनिवार होताच, त्यामुळे बजरंगबलीचे दर्शन घेऊन पुढे निघालो.

मी गाडीरस्त्याने न जाता गावामागून जाणारी पायवाट पकडली. समोर अंजनेरीची रांग सकाळच्या उन्हात चमकत होती. 

अंजनेरी किल्ल्याची वाट दक्षिणोत्तर असल्यामुळे या वाटेवर सकाळी पूर्ण वेळ सूर्य असतो. त्यामुळे सकाळी लवकर सुरूवात करणे केव्हाही श्रेयस्कर! अंजनेरीच्या रांगेत अलिकडे नवरा नवरीचे सुळके दिसतात. सह्याद्रीचं हे एक बरं आहे. कुठल्याही डोंगररांगेवर आजूबाजूला 
थोडा झूम करून 
अजून थोडा झूम करून 

त्या घळीच्या वाटेवर कातळावर रंगवलेले श्रीमारूतीराय दिसतात. 
तिथून पुन्हा पायर्‍या सुरू होतात ते पहिल्या पठारापर्यंत! 
वाटेत डाव्या बाजूला कातळात दोन गुहा आहेत. तिथे मुक्काम करता येऊ शकतो. 

त्या पायर्‍या संपल्या की आपण येऊन पोचतो ते एका पठारावर. इथपर्यंत अर्धं अंतर पार झालेलं असतं. 
या पठारावर अंजनी मातेचं एक मंदिर आहे. 
मंदिराजवळच एक मोठा तलाव आहे. 
त्याच्या शेजारुन दोन वाटा फुटतात. त्यापैकी पायर्‍यांची वाट माथ्याकडे जाते आणि डावीकडची पायवाट सीतेच्या आश्रमाकडे जाते. ऊन्ह वाढायच्या आत वर जाऊन येऊ असं ठरवून मी आधी पायर्‍या पकडल्या. पायर्‍यांच्या वाटेवर मध्येच एक पायवाट एका गुहेकडे जाते. त्या वाटेवर 'हनुमान जन्मस्थान' अशा अर्थाची पाटी आहे. कड्याच्या पोटात एक गुहा, गुहेच्या बाहेर झाडावर घंटा, गुहेपाशी गदा आणि गुहेमध्ये अंजनी मातेची शिळासदृश मूर्ती! 


अंजनी माता आणि वानरमुखी हनुमान यांच्या मूर्ती आणि पुढ्यात शिळा आहेत. 

मंदिरात एक गावकरी भेटला. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी वास्तव्यास असताना खोदलेली पाण्याची कुंडे इथून जवळच आहेत अशी माहिती त्याने दिली. (नवनाथांच्या पोथीमध्येही याचा उल्लेख आहे, म्हणे!) कमी अधिक खोलीची एकूण अकरा कुंडे आहेत. काही काही बर्‍यापैकी खोलही आहेत असे वरून डोकावल्यावरही जाणवते. 
अंजनेरीच्या पश्चिम कड्यावरून दिसणारा ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर गाव 
आपण ज्या वाटेने चढून येतो ते पठार - 
भटक्यांच्या 'visual डिक्शनरी'त एकावर एक रचून ठेवलेले दगड हे वाट चुकू नये म्हणून केलेल्या खुणेचे असतात. अंजनेरी माथ्यावर अशा अनेक दगडांचे अनेक मनोरे दिसतात. यांचा अर्थ वेगळाच आहे. 
देवाला नवस बोलल्यावर हे उभे केले जातात. याचा देवासाठी मतितार्थ असा की 'नैसर्गिक क्रियेमुळे (वारा, पाऊस इत्यादी) हे एकावर एक ठेवलेले दगड कोसळायच्या आत मनातील इच्छा पूर्ण कर'!
माथ्यावरून पठाराचा आणखी एक फोटो - 
या फोटोतल्या वरचा जलाशय हे पठारावरील तळं, तर खालचा पाणीसाठा हा अंजनेरीशेजारचा धरणाचा जलाशय! दोन जलाशयांमध्ये हजार फूट खोली आहे, एवढाच काय तो फरक! 
पायर्‍या उतरून पठारावर आलो आणि सीतेच्या आश्रमाकडे निघालो. या गुहेमध्ये अंजनी आणि सीतामाईची भेट झाली असे सांगतात. 
ही मंदिरे पाहिल्यावर मला लगेच आजोबा डोंगरकुशीतल्या वाल्मिकी आश्रमाची आठवण झाली. 
आधी पठार, मग पायर्‍या मग पायवाट उतरून गावात आलो तेव्हा फक्त साडे अकरा झाले होते. बर्‍याच दिवसांनी भटकायला मिळाले होते. एकट्याने केलेली ही बहुधा पहिलीच अपरिचित किल्ल्याची भटकंती! short but sweet! नाशिक प्रांतातल्या या पहिल्यावाहिल्या किल्ल्यांनंतर हा सिलसिला सुरू होवो ही सह्याद्रीबाबाकडे प्रार्थना!

(अवांतरः अंजनेरीसारख्या डोंगराला रामायणामध्ये जर पर्वत म्हणत असतील, तर अजून तीन चारशे वर्षांनी सह्याद्रीमध्ये 'रायपर्वत', 'राजपर्वत', 'सिंहपर्वत' अशी नामे प्रचलित व्हायला हरकत नाही, असा विचार माझ्या मनात येऊन गेला, एवढंच!)


मारुतीचे जन्मस्थान:  अंजनेरी पर्वत 
"बरेच दिवस ट्रेक ला जायचे होते पण मुहूर्त लागत नव्हता.आणी मग तो कसा जुळून आला." अश्या आणी तत्सम वाक्यांनी टिपिकल सुरुवात न करता सरळ प्रवास अनुभव मांडायला चालू करतो. हल्ली लिहायचा घाट घालणे आणी मुळात त्यासाठी डोके चालवणे दुरापास्त झाले असल्याने याआधी काही ट्रेकचे फक्त फोटो डकवले होते. आताही काही वेगळी स्थिती नाही पण थोडेसे "समालोचन" लिहून नुसते फोटो बघणार्यांना हिरमोड  होईल याची काळजी घेतो.
 असो, तर यावेळचा प्लान होता त्रंबक रेंज मधील अंजनेरी पर्वत आणी हरीहर हर्षेगड किल्ला. 
खरा प्लान फक्त हरीहरच होता फक्त पण जरा शोधल्यावर कळले कि अंजनेरी पण ऑन रोड आणी जवळच आहे आणि तेथे मारुतीचे जन्मस्थान असून रामायणकालीन सुमारे २००० वर्षे जुनी हेमांडपंथी मंदिरे आहेत.
म्हणून मग प्लान चेंज करून पहिला अंजनेरी किल्ला केला आणि मग हरीहर किल्ला.

तसेही मारुतीला जायचा उद्देश देवाचे दर्शनाखेरीज वेगळाच होता पण तो आत्ता सांगत नाही. :)

शिवाजीनगर स्टेशन वरून रात्री शेवटची सव्वा दहाची ( १०:१५ ) त्र्यंबक यष्टी पकडली आणी खिडकी मोकाट सोडून झोपून घेतले. डायवर काका जोरदार गाडी मारत होते. टकलूची सुट्टी जोडून आल्याने आणी नवरात्र उत्सव चालू असल्याने त्र्यंबकेश्वर जाणार्यांची बर्यापैकी गर्दी होती. पहाटे ३ ला गाडी नाशिक ला आली तर तर लोक लोंढ्याने घुसत होते. कमाल आहे लोकांची !!

पहाटे ५ ला गाडी त्र्यंबक पोहोचली लगेच दुसरी त्र्यंबक-नाशिक गाडी पकडून अंजनेरी फाटा उतरलो. अजून पुरेसे उजाडले नव्हते. अंधारात एक गावकरी दिसला त्याला झोपायची सोय विचारताच त्याने एका मंदिराकडे बोट दाखवले. लगेच मंदिरात पोहोचून कसले मंदीर आहे ते न पाहताच आमचा डेरा टाकला.

तासभर झोप झाली आणी पुरते उजाडले असल्याने उठून बसलो. बरोबर त्र्यंबक-नाशिक रस्त्याच्या मधोमध असलेल्या आणि आता स्तलांतरित होत असलेल्या मंदिरात आम्ही झोपलो होतो. बसल्या जागेवरूनच मागे वळून पाहतो तर आमचा ट्रेकी दोस्त नवीन लाल शर्ट घालून हिंडत चालला होता.
याच मंदीरात आम्ही पसरलो होतो. हे कार्तिक स्वामींचे मंदीर होते. त्याच्या समोरच अजून एक प्रशस्त असे गणपती मंदीर होते.
 
पांघरूण आवरते घेतले आणी फोटो चालू केले. 

काका यष्टीची वाट बघत होते. त्यांना बोलते करून सगळी माहिती काढून घेतली.
नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने काही भाविक लोक देवीची कावड वाजतगाजत घेऊन निघाले होते. एक टेम्पो, त्यात मोठे स्पीकर, देवाची वाटत नसलेली पण असलेली धतींग गाणी आणी त्यामागे चालणारे असंख्य भाविक. खांद्यावर कावड, पाय अनवाणी, भगवी वस्त्रे आणी जोडीला देवीचा जागर. कमाल वाटत होते बघताना !!
त्र्यंबकमध्ये गोदावरी नदीचा उगम होतो. त्यामुळे तेथून दोन तांब्यात गोदावरी उगमाचे पाणी भरून घेऊन ते त्र्यंबक ते वणीची देवी असे जवळ जवळ १०० किमी अंतर चालत आणी ते पण चप्पल न घालता जातात . आणी मग १-२ आठवड्याने तेथे पोहोचल्यावर त्या पाण्याने देवीला अभिषेक करूनच मग अंघोळ करतात.
१०० किमी चालत ???? आपल्याला गाडीने जाणे होत नाही.
गावात शिरलो. छोटेसे तळे आहे गावात, तेथे फ्रेश झालो आणी अंजनेरी गावातील बघण्यासारखी गोष्ट म्हणजे सिद्ध हनुमान मंदिरात आलो. ही हनुमानाची मूर्ती १५ फुट उंच आहे. त्याची गदाच ६ फुट आहे. :)
आम्ही दर्शन घेऊन पाणी भरून घेतले. आणी पुजारीकाकाना परत कसे जायचे आणी इतर माहिती विचारून अंजनेरी किल्ल्याच्या दिशेने चालू लागलो.

सिद्ध हनुमान मंदिरापासून मागे वाट जाते ती पकडून गावात गेलो. काही ढाबे आहेत गावात ते नुकतेच उघडत होते म्हणून जरा वेळ घालवला आणी एका हॉटेलात पोह्यांची ऑर्डेर दिली. पोहे खाऊन पकलो असलो तरी आज हे पोहे मस्त लागत होते कारण भूक लागली होती.
समोरच अवाढव्य असा अंजनेरी पर्वत उभा होता. "पर्वत" हा शब्द ऐकला की मनात धडकीच भरते. पण हा त्यामानाने ज्युनीअर म्हणता येईल.
कड्यासारखा दिसतोय तो डोंगर चढून त्यावर अजून एक डोंगर आहे. बरोबर ८:३० ला चढाई चालू केली आणी मग रमत गमत फोटो काढत, मंदिरे शोधत मंडळी निघाली. त्यात एक बरे कि ३च लोक असल्याने वेळ जायचा प्रश्नच नव्हता. जे सुटलो ते डायरेक्ट पायथ्याशी असलेल्या अंजनीमातेच्या मंदिरातच.

अंजनीमातेच्या मंदिरामध्ये असलेल्या पुजाऱ्याने आम्हाला अजून डिटेल्स दिले. २००० वर्षापूर्वीची मंदिरे जी आम्हाला किल्ला उतरून शोधायची होती ती लोकेट करून दिली. वरती काय काय पाहण्यासारखे इथपासून ते हनुमानाचा जन्म कसा झाला आणी किल्ल्यावरील तळ्याचा आकार डाव्या पायाच्या पंजासारखा आहे तो कसा झाला इथपर्यंत माहिती पुरवली.
त्यां











अंजनेरी, नाशिक येथील जैन व हिंदू मंदिरे
अंजनेरी हे नाशिक-त्रंबकेश्वरनजीकचे गाव किल्ला व हनुमानाचे जन्मस्थान म्हणून अनेकांना परिचित आहे. तुलनेने चारपाच समूहाने मध्ये विखुरलेली यादवकालीन जैन व हिंदू मंदिर अल्पपरिचित आहेत. या अकराव्या बाराव्या शतकातील मंदिरांचा अंजनेरी व नाशिक परिसराचे धार्मिक महत्त्व वाढवण्यात मोठा वाटा आहे. यादवांच्या सुरुवातीची राजधानी नाशिक परिसरात सिन्नर (सेऊणनगर) येथे होती. यादवांनी विशेषतः सेऊणचंद्र तिसरा यांनी हिंदूंबरोबरच जैन धर्माला आश्रय दिलेला येथील शिलालेख व काही ताम्रपटांमधून आपल्याला समजतो. त्याची साक्ष अंजनेरी येथील दगडी प्रकारातील जैन मंदिरे व मठांमध्ये सापडते.

या प्राकारातील मंदिरे तुलनेने लहान आकाराची असून बहुतांशी मंदिरांवर नागर पद्धतीची उंच शंखू शिखरे आढळतात. प्राकाराला लागून अनेक खोल्यांची शिखर विरहित जैन मठाची इमारत आहे. आज महानुभाव ठाणे असलेल्या एका मंदिरात ललाटबिंबावर (दारावरची मधली शिल्पचौकट) ध्यानस्थ तीर्थांकर दिसतात तसेच सर्पफणा असलेले पार्श्वनाथ व सुपार्श्वनाथ कोरलले आहेत. याचे छताचे नक्षीकाम अप्रतिम आहे व गाभाऱ्यात जैन तीर्थंकराचे दगडी कोरीव आसन रिकामे आहे. आवारात अनेक हिंदू व जैन मूर्ती, हत्ती, गणपती, नाग शिळा, वीरगळी विखुरलेल्या आहेत तसेच जैन मुनींच्या यम-सल्लेखना (religious suicide) दर्शवणाऱ्या स्मारकशिळा आहेत.

हिंदू मंदिरांमध्ये उंच जगतीवर असलेले विष्णू मंदिर विशेष उल्लेखनीय आहे. अनेक लघु शिखरांच्या रांगांची चवड रचलेले भूमीज पद्धतीचे, त्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक प्रचलित असलेले शिखर आपल्याला इथे दिसते. मंदिराची आज अवस्था वाईट असली तरी बाह्य भिंतीवरील देवकोष्टांमधील विष्णूच्या वराह अवतार, त्रिविक्रम विदर्ण-नरसिंह व योगेश्वर विष्णूमूर्ती महत्वपूर्ण आहेत. गर्भगृहात नंतरची नरसिंह हिरण्यकक्षिपूवधमूर्ती आहे व पीठावर विष्णूचे वाहन गरुड स्पष्ट दिसते. मागील अंजनेरी किल्ला व ब्रह्मगुरीच्या शिखराच्या पार्श्वभूमीवर ही पुरातन मंदिरे विलक्षण दिसतात.

https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-saili-palande-datar-writes-about-five-beautiful-temples-in-maharashtra-5331498-PHO.html


   


http://rajukisanmisal.blogspot.com/2013/02/blog-post.html?m=0

 


Related Posts:
https://www.teamgsquare.com/2019/10/birthplace-of-lord-hanuman-anjaneri.html
 













No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...