




लेणे क्र. १ ते ४ सामान्य प्रतीची असून त्यांस बाहेर ओसरी, आत भिक्षूंच्या निवासासाठी खोल्या व दगडी बाक कोरले आहेत.
लेणे क्र. ६ - हे चैत्यगृह दक्षिणाभिमुख असून याचा चैत्यगवाक्ष पूर्णपणे बंद आहे. हे या गटातील प्रमुख चैत्यगृह आहे. दर्शनी भागात स्तंभ असलेला व्हरंडा असून चापाकृती विधानातील प्रार्थनामंडप स्तंभाच्या दोन ओळींनी तीन भागात विभागलेला आहे. हा लयननिर्माण तंत्रातील बदल निश्चितपणे चैत्यगृहस्थापत्यातील नवा टप्पा सूचित करतो.







लेणे क्र. ७ :- ही जुन्नर तालुक्यातील सर्वात मोठी गुंफा(विहार) आहे. विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असुन तीन बाजुला वेगवेगळ्या आकाराचे 20 निवासकक्ष आहेत. या विहारात प्रवेशासाठी दगडात कोरलेल्या पायर्यांचा जीन आहे. जिन्याच्या शेवटी स्तंभ असलेल्या व्हरांड्यातील मधल्या दारातून विहार प्रवेश करता येतो.विहाराच्या प्रांगणात व डावीकडे पाण्याची टाकी खोदली आहेत, तर दर्शनी भागावर दगडी बाकांवर आधारित सहा स्तंभ आणि दोन्ही बाजूंच्या कडेस अर्धस्तंभ कोरले आहेत.


गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.
श्री गिरिजात्मक मंदिर आणि परिसर
या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.
असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.
पूजा आणि उत्सव
दर्शनाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ६ आहे. या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते. ही पूजा अतिशय महत्वाची आहे.
इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.
लेणे क्र. १४ :- हे या गटातील दुसरे चैत्यगृह आहे. परंतु याचा आकार गजपृष्ठाकृती नसून काटकोनी आहे. पूर्वी दर्शनी भागावर कलश व अष्टकोनी स्तंभ होते; त्यांचे काही अवशेष छतावर शिल्लक आहेत. घराच्या छतास लाकडी तुळया लावतात, तसेच येथेही बाहेरील छतावर तुळयांची प्रतिकृती दगडात दिसते. या चैत्यगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या आतील मंडपाचे छत सपाट असून, मागील बाजूस भिंतीपासून अलग असलेला स्तूप कोरलेला आहे. त्यावर वेदिकापट्टी, हर्मिका व छतात कोरलेली छत्री आहे. स्तूप, भिंती व छतावर मातीचा गिलावा व रंगकाम केल्याचे काही अवशेष दिसतात. या चैत्यगृहाच्या दरवाजावरील शिलालेखात उपासक तापसचा पुत्र व उपासक कपिलचा नातू ‘आनंद’ याने हे चैत्यगृह पुण्यकर्मार्थ दान दिल्याचे म्हटले आहे.
लेणे क्र. १५ ते १९ :- यांचा विन्यास बराचसा लेणे क्र. ८ शी जुळतो; परंतु ठिसूळ दगडांच्या थरांमुळे यांतील बऱ्याच लेण्यांचे दर्शनी भाग व आतील काही भिंती पडल्या आहेत.
लेणे क्र. २० :- हे लेणे नसून एका ओळीत पाण्याची तीन टाकी आहेत. त्यांतील दोन टाक्यांवर दान दिल्याचे लेख आहेत. पहिल्यात कल्याणचा सुवर्णकार कुडीरचा मुलगा ‘सधक’ याने हे टाके खोदण्यास दान दिल्याचा उल्लेख आहे. तर दुसऱ्यात दोन स्त्रिया, तोरिकाची पत्नी ‘लक्ष्मी’ आणि ऋषी मूल्यस्वामीची पत्नी ‘नादबालिका’ यांनी सदर टाकीस दान दिल्याचा उल्लेख आहे.
लेणे क्र. २१ व २३ :- यांचा वापर ‘भोजनमंडप’ म्हणून केला जात असावा, असे नागराजू यांचे मत आहे. २१ क्र.च्या बाहेर डाव्या बाजूस विशाल टाकी आहे.
लेणे क्र. २५ ते २८:- यांचे विधान थोड्याफार फरकाने लेणे क्र. ८ प्रमाणेच आहे. लेणे क्र. २६ मधील शिलालेखात, कपिचितच्या संघास उपासक सामरचा पुत्र शिवभूतीने लेणे दान दिल्याचा उल्लेख आहे. उर्वरित लेणी साधारण आहेत.
या ३० शैलगृहांपैकी गुंफा क्र. ६ व १४ हे चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ असून बाकीचे विहार म्हणजे भिक्षुकांची निवासस्थाने आहेत.या पैकी गुंफा क्र.७ हा सर्वात मोठा( प्रशस्त )विहार आहे. बाकिच्या इतर गुंफा(लेणी) विहार लहान असुन काही दोन ते तीन भागात विभागलेल्या दिसतात. या सर्वांचा कालखंड पहिले शतक ते तीसरे शतक असाच गणला गेला आहे.
गणेश लेणीच्या पूर्वेकडील लेणी-समूह, जुन्नर.
गणेश लेणीच्या पूर्वेकडील लेणी-समूह : सुलेमान लेणी
बौद्ध लेणी आणि हे वेगळे नाव. ही लेणी लेण्याद्री रांगेतील पूर्वेकडच्या एका सुटावलेल्या डोंगरात आहे. गणेश लेण्यांचाच हा एक भाग आहे, परंतु कोणी सुलेमान नामक व्यक्तीने याचे संवर्धन केले म्हणून याला सुलेमान लेणी म्हटले जाऊ लागले. या समूहाकडे जाण्यासाठी लेण्याद्री डोंगराच्या पायथ्यापासून पूर्वेकडे, सुमारे १.०६ किमी. अंतरावर, बल्लाळवाडीच्या साधारण वायव्येस असलेल्या दोन डोंगरांच्या घळीत जावे लागते. उजव्या डोंगरावर पाच व त्याच्या विरुद्ध बाजूच्या डोंगरावर तीन अशी एकूण आठ लेणी येथे आहेत. येथे उजव्या बाजूस एक सुंदर चैत्यगृह आहे. चैत्याचा दर्शनी भाग सरळ उभ्या असलेल्या (किंवा जमिनीशी काटकोनात) उंच कपारीत कोरला असून दर्शनी भागाची उंची ७.६२ मी. व रुंदी ६.१० मी. तर चैत्यगृहाची खोली सुमारे ७.८० मी. आहे. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर अप्रतिम नक्षीकाम केले आहे. प्रवेशद्वार १.०६ मी. रुंद असून त्यावर व त्याच्याशी समांतर दोन्ही बाजूंस अशा एकूण ३ चैत्यकमानी कोरल्या आहेत. त्याच्या वरच्या बाजूस लहानसा अरुंद सज्जा (Gallery) आहे. त्यावर पिंपळाच्या पानाच्या आकारासारखे एक देखणे चैत्यगवाक्ष असून ते आरपार कोरलेले आहे. संपूर्ण गवाक्षाच्या अर्धवर्तुळाकार पट्टीवर एकात-एक गुंफलेली सहा पाकळ्यांची फुले कोरली आहेत. एका पाकळीची दुसऱ्या पाकळीशी गुंफण फारच प्रमाणबद्ध कोरली आहे. वरील टोकास त्रिरत्नांचे चिन्ह आहे. पश्चिम भारतातील कोणत्याही चैत्यगवाक्षाच्या पट्टीवर याच्यासारखी नक्षी कोरलेली नाही. चैत्यकमानीच्या वरील बाजूस दोन लहान चैत्यकमानी असून त्यांत स्तूप कोरलेले आहेत. गवाक्षाच्या उजव्या बाजूस एकात-एक गुंफलेल्या त्रिदलाची नक्षी (Triskelion) व त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर स्वस्तिकांचा पट्टा चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस कोरला आहे. तसेच उजव्या भिंतीवर चैत्यकमानीत पीठावर धर्मचक्र कोरले आहे. याच्यावर पुन्हा लहान चैत्यकमानी व वेदिकापट्टीची नक्षी दिसते. डाव्या बाजूस भिंतीवर असेच कोरीव काम असून मोठ्या कमानीत बोधिवृक्ष कोरला आहे. यातील त्रिदल नक्षीचे खास वैशिष्ट्य आहे. नाशिकच्या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर ही नक्षी कोरली असून महाराष्ट्रातील इतर कोणत्याही लेण्यांत ती दिसत नाही. प्राचीन ग्रीक नाण्यांवर हे चिन्ह दाखविले आहे. येथून जवळच असलेल्या बल्लाळवाडीनजीक ‘इरॉस’ या ग्रीक देवतेचे लहानसे शिल्प सापडले होते. या सर्व निरीक्षणांवरून देणगी देणारा किंवा कारागीर यवन म्हणजे ग्रीक असावा, असे सुरेश जाधव यांचे मत आहे.

चैत्याच्या आत, मागील भिंतीपासून अलग असलेला, हर्मिकेसह स्तूप दिसतो. चैत्यगृहाचे विधान चापाकार आहे. तसेच छत गजपृष्ठाकृती आहे. परंतु एकंदरीत ही लेणी अपूर्ण राहिली आहे. याचे विधान व सर्वसाधारण कलाकुसर नाशिक लेणे क्र. १८ व अजिंठा लेणे क्र. ९ च्या चैत्याशी जुळणारी आहे. सुरेश जाधव यांनी या चैत्यगृहाचा काळ इ. स. पू. पहिल्या शतकाच्या अखेरीस किंवा इ. स. पहिल्या शतकातील पहिली दोन दशके ठरविला आहे. या समूहातील इतर लेणी साधी आहेत. त्यांतील एक बऱ्यापैकी विहार आहे. त्यास ओसरी, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस खिडक्या, आत मंडप व काही खोल्या आहेत.
गणेश लेणीच्या पूर्वेकडील लेणी-समूह : या समूहाकडे जाण्यासाठी लेण्याद्री डोंगराच्या पायथ्यापासून पूर्वेकडे, सुमारे १.०६ किमी. अंतरावर, बल्लाळवाडीच्या साधारण वायव्येस असलेल्या दोन डोंगरांच्या घळीत जावे लागते. उजव्या डोंगरावर पाच व त्याच्या विरुद्ध बाजूच्या डोंगरावर तीन अशी एकूण आठ लेणी येथे आहेत. येथे उजव्या बाजूस एक सुंदर चैत्यगृह आहे. चैत्याचा दर्शनी भाग सरळ उभ्या असलेल्या (किंवा जमिनीशी काटकोनात) उंच कपारीत कोरला असून दर्शनी भागाची उंची ७.६२ मी. व रुंदी ६.१० मी. तर चैत्यगृहाची खोली सुमारे ७.८० मी. आहे. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर अप्रतिम नक्षीकाम केले आहे. प्रवेशद्वार १.०६ मी. रुंद असून त्यावर व त्याच्याशी समांतर दोन्ही बाजूंस अशा एकूण ३ चैत्यकमानी कोरल्या आहेत. त्याच्या वरच्या बाजूस लहानसा अरुंद सज्जा (Gallery) आहे. त्यावर पिंपळाच्या पानाच्या आकारासारखे एक देखणे चैत्यगवाक्ष असून ते आरपार कोरलेले आहे. संपूर्ण गवाक्षाच्या अर्धवर्तुळाकार पट्टीवर एकात-एक गुंफलेली सहा पाकळ्यांची फुले कोरली आहेत. एका पाकळीची दुसऱ्या पाकळीशी गुंफण फारच प्रमाणबद्ध कोरली आहे. वरील टोकास त्रिरत्नांचे चिन्ह आहे. पश्चिम भारतातील कोणत्याही चैत्यगवाक्षाच्या पट्टीवर याच्यासारखी नक्षी कोरलेली नाही. चैत्यकमानीच्या वरील बाजूस दोन लहान चैत्यकमानी असून त्यांत स्तूप कोरलेले आहेत. गवाक्षाच्या उजव्या बाजूस एकात-एक गुंफलेल्या त्रिदलाची नक्षी (Triskelion) व त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर स्वस्तिकांचा पट्टा चैत्यकमानीच्या दोन्ही बाजूंस कोरला आहे. तसेच उजव्या भिंतीवर चैत्यकमानीत पीठावर धर्मचक्र कोरले आहे. याच्यावर पुन्हा लहान चैत्यकमानी व वेदिकापट्टीची नक्षी दिसते. डाव्या बाजूस भिंतीवर असेच कोरीव काम असून मोठ्या कमानीत बोधिवृक्ष कोरला आहे. यातील त्रिदल नक्षीचे खास वैशिष्ट्य आहे. नाशिकच्या चैत्यगृहाच्या दर्शनी भागावर ही नक्षी कोरली असून महाराष्ट्रातील इतर कोणत्याही लेण्यांत ती दिसत नाही. प्राचीन ग्रीक नाण्यांवर हे चिन्ह दाखविले आहे. येथून जवळच असलेल्या बल्लाळवाडीनजीक ‘इरॉस’ या ग्रीक देवतेचे लहानसे शिल्प सापडले होते. या सर्व निरीक्षणांवरून देणगी देणारा किंवा कारागीर यवन म्हणजे ग्रीक असावा, असे सुरेश जाधव यांचे मत आहे.

चैत्याच्या आत, मागील भिंतीपासून अलग असलेला, हर्मिकेसह स्तूप दिसतो. चैत्यगृहाचे विधान चापाकार आहे. तसेच छत गजपृष्ठाकृती आहे. परंतु एकंदरीत ही लेणी अपूर्ण राहिली आहे. याचे विधान व सर्वसाधारण कलाकुसर नाशिक लेणे क्र. १८ व अजिंठा लेणे क्र. ९ च्या चैत्याशी जुळणारी आहे. सुरेश जाधव यांनी या चैत्यगृहाचा काळ इ. स. पू. पहिल्या शतकाच्या अखेरीस किंवा इ. स. पहिल्या शतकातील पहिली दोन दशके ठरविला आहे. या समूहातील इतर लेणी साधी आहेत. त्यांतील एक बऱ्यापैकी विहार आहे. त्यास ओसरी, प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस खिडक्या, आत मंडप व काही खोल्या आहेत.
या लेण्या अष्टविनाय गणपती ” गिरीजात्मज ” कामुळे जगप्रसिद्ध असुन इतर लेण्या प्रसिद्धीपासून खुपच वंचित झालेल्या आहेत. आपण एकदा या संपूर्ण लेण्यांना आवश्य एकदा भेट देऊन आनंद घ्यावा हीच सदिच्छा.
संदर्भ :

















No comments:
Post a Comment