पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या तालुक्याच्या ठिकाणाहुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या भोरगिरी गावात जाता येते. राजगुरुनगर हे पुणे नाशिक रस्त्यावर चाकणपासून १० कि.मी.वर आहे. राजगुरूनगर पासून ५० कि मी सह्याद्रीच्या कुशीत वसलेले भोरगिरी हे छोटेसे गाव . येथे सकाळी १० वाजे पर्यंत पोहोचण्यास एस टी बस ची सोय आहे . राजगुरूनगर हून भोरगिरीला जाणारी पहिली बस सकाळी ८ वाजता आहे आणि नंतर ९:१५ वाजता आणखीन एक बस सुटते तसेच पहाटे ४ वाजता राजगुरुनगरला पोहोचणारी मुंबई ते भोरगिरी अशी पण एक बस आहे. पण सकाळी ९:१५ नंतर मात्र बस मिळणे मुश्कील मग सगळे काही खासगी वाहने जीप या वरती आपला प्रवास अवलंबून आहे. १.५ ते दोन तासात बस ने भोरगिरी या गावात आपण पोहोचतो ,राजगुरुनगर ते भोरगिरी हे अंतर साधारण ५० कि.मी.असुन राजगुरुनगर येथे डावीकडे वळून चासकमान, वाडा या गावांवरून टोकावडेमार्गे जाणारा रस्ता भोरगिरी गावात जातो. इथून पायवाटेने भीमाशंकर फक्त सहा किलोमीटरवर आहे.
भोरगिरी राजगुरूनगर तालुक्यातलं शेवटचं गाव. गाव म्हणण्यापेक्षा वस्ती म्हणूयात. १५-२० घरांच्या दोन वाड्या आहेत. गावाच्या उजव्या बाजुच्या टेकडीवर असलेला लहानसा भोरगिरी किल्ला त्यावरील कातळात खोदलेल्या गुहा आणि भगवा ध्वज यामुळे सहजपणे नजरेस पडतो.
मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे
गावात शिरतानाच भीमा नदीच्या काठावर मुळ गर्भगृह कायम ठेवुन नव्याने बांधलेले कोटेश्वर मंदिर दिसते. मंदिराच्या आवारात अनेक कोरीव दगड विखुरलेले आहेत. यात मंदिराचे खांब,भारवाहक, कीर्तिमुख, वीरगळ, कळसाचा आतील भाग तसेच दोन शरभ दिसुन येतात.
पारावर मनुष्य आणि वाघाचा युद्धप्रसंग कोरलेले शिल्प ठेवले आहे. विखुरलेल्या या अवशेषावरून मंदिराच्या भव्यतेची कल्पना करता येते. साधारण ९-१० व्या शतकात शिलाहार वंशीय झंझराजाने जी १२ शिवमंदिरे बांधली त्यातील एक म्हणजे भोरगिरी उर्फ भवरगिरी गावातील कोटेश्वर मंदिर होय.
मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंडी असुन गाभाऱ्या बाहेर गणपतीचे एक आगळेवेगळे शिल्प आहे.
जेमतेम दीड फूट उंचीच्या उभ्या असलेल्या या गणेशमूर्तीच्या कमरेखालील बाजुस मुलींच्या स्कर्टप्रमाणे वस्त्र कोरलेले आहे. चतुर्भुज गणेशाच्या उजव्या हातात परशू असुन डाव्या हातातील फळावर गणपतीची सोंड टेकलेली आहे. गणपतीची मूर्ती रोमन आणि ग्रीकांशी त्या काळी चालू असलेल्या व्यापाराची साक्ष देणारी..कोटेश्वर मंदिराचे जुने अवशेष त्याची प्राचीन सुंदरता स्पष्ट करत होते.भीमा नदीच्या काठावरचं हे शंभूमहादेवाचं मंदिर आणि घाट साधारण नवव्या शतकातले असल्याचे उल्लेख सापडतात. गडावरच्या गुहा आणि बांधकाम देखिल याच काळातलं. भोरगिरी किल्ल्याचं एक नाव भंवरगिरी असंही आहे. किल्याच्या नावावरूनच गावाचं नाव भोरगिरी असे पडले.भोरगिरी म्हणजे किल्लेवजा एक टेहेळणीची जागा अशासाठी बांधला गेलेला किल्ला. भोरगिरी समुद्रसपाटीपासून साधारण ८५० मीटर उठावला आहे. पण गावातून त्याची उंची १५० मीटरच्या आसपास असेल.
भिमा नदीचा उगम सह्याद्रीतील भिमाशंकर या डोंगररांगेत होतो व या डोंगर रांगेच्या पायथ्याशी असणारी जमीन सुपीक करत ती राजगुरूनगर येथे येते. भिमा नदीच्या या खोऱ्यात वसलेला एक छोटेखानी दुर्ग म्हणजे भंवरगिरी उर्फ भोरगीरी (Bhorgiri Fort). भोरगिरी – भिमाशंकर – खांडस हा प्राचिन व्यापारी मार्ग होता. त्याकाळी कल्याण बंदरात उतरणारा काही माल ह्या मार्गाने घाटावर खेड राजगुरूनगरकडे येत असे. भिमाशंकरच्या पायथ्याशी कोकणच्या बाजुला खांडस गावाकडे पदरगड तर घाटावरील बाजुला भोरगिरी हे दोन प्राचीन किल्ले ह्या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बांधले गेले.गावातून ३० मिनिटात गडमाथा गाठता येतो.
गडावरील गुहेत गावातुन वीज नेली असल्याने या खांबाच्या आधारे गडावर जाणारी वाट सहज कळून येते. गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो.

पायथ्याशी वनखात्याने निवारा बांधलेला असुन गडावर जाणारी वाट खोदुन प्रशस्त केलेली आहे. या वाटेवर पायऱ्या बांधण्याचे तसेच लोखंडी कठडे उभारण्याचे काम चालू आहे. डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारत गडाची वाट वर जाते व आपण गडाखाली असणाऱ्या दोन गुहाच्या पहिल्या टप्प्यात पोहोचतो.
वाटेतल्या ओढ्यावर शासनाने बांधलेला बंधारा आडवा आला.तो पार करून गडाच्या वाटेला लागलो. वाट उभ्या चढणीची आहे. ही चढण दमछाक करणारी आहे. थोडं वर जाताच एक वाट सरळ गडावरल्या गुहेकडे जाते आणि एक वाट उजवीकडून गडाला वळसा घालून माथ्यावर जाते. हिलाच पुढे जाऊन गुहेकडून येणारी वाट येऊन मिळते. गुहेकडे जाण्यार्या वाटेवर सोप्या श्रेणीतील प्रस्तरारोहण करून १५ मिनिटात गुहेत पोहचतो.
भोरगडाची गुहा एकदम प्रशस्त आहे. इथे ४०-५० लोकांची झोपण्याची सोय होऊ शकते. गुहेचे एकंदरीत खोदकाम आणि आतील रचना पहाता या बौद्ध भिक्षुंसाठी खोदलेल्या लेण्या वाटतात पण नंतरच्या काळात त्याचे रुपांतर देवस्थानात झाले आहे.
गुहेच्या बाहेरील बाजुस डाव्या बाजूच्या कोरड्या टाक्याशेजारी पिंडी व नंदी आहे. एक पुरातन शिवलिंग आहे
गुहेच्या आत गाभार्याच्या खोलीत शंकराची पिंड आहे.
त्यावर लहान लहान १२ पिंड आहेत. ही बारा पिंड बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिक आहेत अशी माहीती स्थानिकांकडून मिळते. शेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. त्यातील थंडगार आणि मधुर पाणी वर्षभर आपल्या सारख्या भटक्यांची तहान भागवते.
या गुहेच्या पुढे एक अर्धवट खोदलेली गुहा असुन त्याच्या पुढे दुसरी गुहा आहे. हि गुहा प्रशस्त असुन गडावर राहण्यासाठी योग्य ठिकाण आहे.हि गुहा देखील ओसरी आणि गर्भगृह अशी दोन भागात विभागलेली असुन बाहेरील ओसरी चार खांबांवर तोललेली आहे. गर्भगृहात शिवलिंग असुन बाहेरील भिंतीवर नागशिल्प कोरलेले आहे. गुहा पाहुन झाल्यावर मागे फिरावे व आल्या वाटेने डोंगर चढायला सुरुवात करावी. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात कातळात कोरलेल्या काही पायर्याह असुन येथुन कोसळलेल्या तटबंदीतून आपला गडप्रवेश होतो.
गुहेपासून उजव्या हाताला गेल्यावर महालक्ष्मीची बारामाही पाण्यात असणारी गुहा आहे. ह्या गुहेच्या गाभार्याच्या खोलीतही माता पार्वती विराजमान आहेत. हि गुहा ओसरी आणि गर्भगृह अशी दोन भागात विभागलेली असुन ओसरीच्या दोनही बाजुला पाण्याची कोरडी पडलेली टाक आहेत.
आतील गुहा चार खांबांवर तोललेली असुन आत अलीकडील काळात देवीची मुर्ती बसवलेली आहे. हि गुहा खूप मोठया प्रमाणात पाझरत असल्याने आत गुडघाभर पाणी जमा झाले आहे. (हरिश्चंद्रगडावर असलेल्या केदारेश्वर मंदिरा सारखी आहे) फक्त येथे पाणी जास्त खोल नाही . अगदी अर्धा फुट खोल असेल पण मे महिन्यात देखील या गुहेतील पाणी बर्फासारखे थंड आहे .सध्या पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते. ह्या पाण्यातून जावून माता पार्वतीचे दर्शन घ्यायचे.
कोठ्यांकडून उजव्या हाताला गेल्यावर झाडीमधे एक-दोन शंकराच्या पिंडी आणि काही दगडी अवशेष आहेत. इथून माथ्याकडे गेल्यावर काही पडकी जोती दिसतात. गडफेरी करताना दगडात खोदलेली ४-५ खांब टाकी नजरेस पडतात.
भोरगिरी किल्ला समुद्रसपाटीपासून २०५८ फूट उंचावर असुन आयताकृती आकाराचा हा किल्ला ४ एकर परिसरात दक्षिणोत्तर पसरला आहे. पायथ्यापासुन मात्र याची उंची साधारण ४५० फुट असावी. गुहेवरून वाट थोडी खाली जाऊन गडमाथ्याकडे जाण्यार्या मुख्य वाटेला येऊन मिळते. गडाचे दरावाजे होते यावर विश्वास बसणार नाही इतकी पडझड झाली आहे. नावालाच शोभाव्या अशा तटबंदीच्या काही खुणा आढळतात.
वर पोहोचल्यावर समोरच गुहासदृश कोठ्या आहेत.गडावर प्रवेश केल्यावर समोरच एक भलेमोठे कोठार दिसुन येते. हे कोठार समोरील बाजुस तीन भागात विभागले असुन त्याच्या उजव्या व डाव्या बाजूस गुहेत कोरलेली दोन पाण्याची टाकी आहेत. यातील डाव्या बाजूचे टाके कोरडे असुन उजव्या बाजूच्या टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. कोठारातील एका भागात वीरगळ ठेवलेली आहे. हे कोठार पाहुन उजव्या बाजूने गड प्रदक्षिणेला सुरुवात करावी.
वाटेच्या सुरवातीला एका झाडाखाली ठेवलेल्या दोन चौकोनी व एक गोलाकार पिंडी व एक मुर्ती दिसुन येते. या मुर्तीच्या पुढील बाजुने एक पायऱ्यांची वाट खाली दरीत उतरताना दिसते. या वाटेने खाली उतरल्यावर उजवीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्या व दोन गुहा पहायला मिळतात. यातील एका गुहेत पाणी साठलेले असुन गुहेबाहेर एक शिल्प ठेवलेले आहे.
दुसरी गुहा मात्र मोठया प्रमाणात माती साठून बुजलेली आहे. या गुहा पाहुन परत वरील पायवाटेवर आल्यावर हि वाट पुढे डाव्या बाजूला खाली उतरते तिथे उध्वस्त तटबंदी व प्रवेशव्दाराचे अवशेष पाहायला मिळतात. येथे झाडीत पडलेले प्रवेशद्वारावरील व्याघ्रशिल्प दिसुन येते. या दरवाजातुन गडाखाली उतरणारी वाट निगडाळे मार्गे भीमाशंकरला जाते. येथुन पुढे जाणारी वाट संपुर्ण गडाला वळसा घालत आपण जेथून सुरवात केली त्या कोठाराकडे जाऊन संपते. या वाटेवर आपल्याला खडकात खोदलेली एकुण अकरा पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील काही खांबटाकी व जोडटाकी असुन सात टाक्यात पाणी आहे तर चार टाकी सुकलेली आहेत. यातील शेवटच्या टाक्यावर एक लहानसे शिवलिंग कोरलेले आहे.इतक्या छोटेखानी गडावर इतक्या जास्त प्रमाणात टाकी का असावीत असा प्रश्न पडतो, पण त्या टाक्यांची जागा लक्षात घेता तटबंदी बांधण्याकरता लागणारा दगड या टाक्यांतूनच काढला असणार हे ध्यानात येते.
या वाटेवरच किल्ल्याची काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी व दोन बुरुज दिसतात. या बुरुजांचे वैशिष्ट म्हणजे हे दोनही बुरुज चौकोनी आहेत.
किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर एक मोठे खोदीव टाके असुन एका जोत्याचे अवशेष दिसुन येतात.
वनखात्याने येथे देखील एक निवारा बांधलेला आहे.
गडावरून दिसणारं भोरगिरी गाव
गडावरून भीमाशंकर अभयारण्याचा दूरवर पसरलेला परीसर व भीमा नदीचे पात्र दिसते.
किल्ल्याचा एकुण आकार पहाता हा टेहळणीचा किल्ला असल्याचे जाणवते. गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला एक तास पुरेसा होतो. पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे या पात्रात रांजणखळगे तयार झाले आहेत. कागदपत्रात गडाचा उल्लेख नसल्याने गडाचा इतिहास अज्ञात आहे.
दुसर्या वाटेने गड उतरायचा. अगदी सावकाश उतरत दहाएक मिनिटात आपण एका सपाटीवर येतो. इथे शेजारूनच डोंगरातून येणारा पावसाळी ओढा आहे. ओढयाजवळ थोडी फोटोग्राफी करून गावाची वाट तुडवायला लागायचे.
अलिकडे भोरगिरी येथे येणारे पर्यटक आणि दुर्गप्रेमी यांची रहाण्याची सोय झाली आहे. निसर्गप्रेमीना निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची सोय म्हणजे भोरगिरी येथील जंगल रिसॉर्ट.एकदा अवश्य भेट द्या व अस्सल गावरान मेजवानीचा आस्वाद घ्या.
संपर्क: 9766325698
भोरगिरी ते भीमाशंकरकडे :-
भोरगिरी किल्ल्याच्या माहितीबरोबर आणखी एका संबधित गोष्टीची माहिती घेउया, ती म्हणजे भोरगिरी ते भीमाशंकर. भीमाशंकरचा ट्रेक करणारे अनेक ग्रुप नेहमीच वेगवेगळ्या वाटांच्या शोधात असतात. त्यातलीच एक विलोभनीय वाट आहे ती भोरगिरी ते भीमाशंकरची. निसर्गरम्य अशा या वाटेवरून भीमाशंकरला पोहोचण्याचा अनुभव काही वेगळाच आहे.सह्याद्रीतील हा एका आगळ्यावेगळा ट्रेक म्हणता येईल ज्यामध्ये खूप जास्त चढण नाही पण भीमाशंकर अभयारण्यातील १२ कि मी चालणे , हि वात कधी भीमा नदीच्या पात्रातून मोठमोठ्या दगड धोंड्यांनी भरलेली खडतर वात तर कधी दाट जंगलातून जाणारी वाट , कधी बैलगाडी जाईल एवढी वाट तर कधी दाट झाडीतून अरुंद पाउलवाट , लेण्या,गुहा, खळगे , सभोवताली उंच डोंगर, जिकडे बघावे तिकडे दाट अरण्य , कधी पक्ष्यांचा किलबिलाट , कधी जंगली जनावरांचे आवाज , नजरेस पडणारी दुर्मिळ शेखरू खार ! या सर्व गोष्टींमुळे हा ट्रेक थरारक , रोमांचक व कडक उन्हाळ्यात देखील एका भटकंतीला सार्थ आनंद मिळवून देतो
| Trek Map of Bhorgiri-Bhimashankar |
हा आनंद एकदा तरी घेण्यासाठी मुंबईहून भल्या पहाटे बोरघाटमाग्रे लोणावळा-चाकण मार्गे राजगुरूनगर गाठायचं. पुण्यावरुन नाशिकला जाणार्या कोणत्याही बसमधून राजगुरुनगर उर्फ खेडला उतरता येईल. एसटीने अथवा स्वत:च्या वाहनाने वाडामार्गे भोरगिरीला डेरेदाखल व्हायचे. गावातूनच एक वाटाडया घ्यायचा अन् भीमाशंकरकडे कुच करायची. या गावातूनच मळलेली एक वाट भीमाशंकरकडे जाते. या वाटेनेच येथल्या पंचक्रोशीतले ग्रामस्थ पायी भीमाशंकरच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिग दर्शनासाठी पायी जात असतात. या पायी जाण्याला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची किनार असते. डोंगरवस्त्यांवर राहणारे हे गरीब ग्रामस्थ एसटीऐवजी ही बिनखर्चाची पाऊलवाट निवडतात. त्यामुळेच या मळलेल्या वाटेवर अनेक भाविकसुद्धा भेटतात. काही जण भक्तिमार्गासाठी तर काही निसर्गभ्रमंतीसाठी.. कोणतेही कारण निवडले तरी ही वाट निराश मात्र करत नाही एवढं नक्की..!
भोरगिरी गावातून थोडे पुढे गेल्यावर जंगलात वन विभागाचे एक लोखंडी फाटक लागेल ते ओलांडून पुढे याच रस्त्याने चालत राहावे. या वाटेत चढण आहे व साधारण ५ कि मी चालल्यावर तुम्हाला पुढे दोन वाटा दिसतील . येथून मुख्य वाट सोडून डावी कडची वाट धरावी . एक कि मी खाली उतरल्यावर दाट झाडी सुरु होतात व वन खात्याची निशाणी असलेल्या दगडे तुम्हाला दिसतील येथून पुढे दाट झाडीतून मार्ग काढत खाली उतरावे आणि दाट झाडींचा टप्पा संपला कि समोर दोन डोंगर मध्ये एक छोटीशी दरी दिसेल व खाली भीमा नदीचे पात्र दिसेल .येथून उजवीकडे चालत राहावे कधी दाट जंगलातून तर कधी नदीच्या पात्रातून.\
भोरगिरीवरून निघाल्यानंतर काही मिनिटांतच आपल्याला पहिल्या टेकडीवर पाय-यांची वाट लागते. याच वाटेने छोटी टेकडी पार केल्यावर आपण पुन्हा सपाटीवर येतो.
या सपाटीवरून पुढे चालत राहिल्यास तीन मोठे ओढे आपल्याला पार करावे लागतात. ओढे कसले जणू काही छोटय़ा नदय़ाच म्हणा! ऐन पावसाळयात चहुबाजूंच्या डोंगरद-यातून वाहत येणा-या या ओढयांचे रूपांतर जणू काही नदीतच झालेले दिसते. हे ओढे अगदी जीवाच्या आकांताने आपली वाट अडवून धावत असतात. त्यामुळेच हे ओढे थोडे साहस आणि तेवढीच सावधानता बाळगून पार करावे लागतात.
यांच्यामधून कमरे एवढया पाण्यातून चालताना पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज जेव्हा पायाला जाणवतो तेव्हा नवख्या व्यक्तीच्या हृदयात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. ओढे पार करत असताना स्थानिक वाटाडयाच्या सूचना दुर्लक्षित करण्याची चूक मात्र आपल्या हातून होता कामा नये म्हणजे मिळवले.
खळाळून वाहणारे ओढे, धबधबे हे जणू या वाटेवरचे सखेसोबतीच. कधी आपली वाट आडवी करून वाहणारे, कधी रस्त्याच्या कडेनेच आपल्यासोबत बोट धरून चालणारे, कधी आपली नजर जाईल तेथे दिसणारे हे पाण्याचे प्रवाह म्हणजे चालणा-या जीवाला विलक्षण आनंद देणारे.. यांच्याबरोबरच डोक्यावर कोसळणारी पावसाची संततधार, धुक्याने ओढलेली चादर हे केवळ अवर्णनीय.
हया सा-यांना सोबत घेऊनच दोन तासांत जेव्हा आपण भीमाशंकरच्या घनदाट अरण्यात प्रवेश करतो तेव्हा जवळपास निम्म अंतर पार झालेलं असतं. या अरण्यातून चालताना धीरगंभीर पावसाचा आवाज आणि दूरवर कोसळणा-या धबधब्यांच्या आवाजाचं तांडव आपल्या कानात घुमू लागतं. हे ऐकतच आपल्या चालण्याचा वेग मात्र वाढत असतो.
नखांनी ओरखडलेल्या खुणा
या पुर्ण वाटचाली दरम्यान आपल्याला जाणवत असते कि आपण जंगली श्वापदांच्या अधिवासात आलो आहोत हे दर्शविणार्या अनेक खूणा नजरेस येतात. कधी एखाद्या वन्य प्राण्यांची विष्ठा, कधी रानडुकरांनी उकरलेली जमीन एक ना दोन. अर्थात त्यासाठी जंगलाला सरावलेली नजर मात्र हवी.
आतापर्यंतच्या पायी प्रवासात आपल्या नजरेला फेसाळ, दुधी रंगाच्या पाण्याची सवय झालेली असते. अन् अचानक आपल्या अवतीभवती वाहणा-या पाण्याचा प्रवाहाचा रंग हा हळूहळू बदलत असल्याचं लक्षात येतं. आतापर्यंत पांढरं शुभ्र असणारं हे पाणी त्याच्यासोबत प्लॅस्टिकचा कचरा, फुलं, मैलामिश्रित घेऊन गढूळ रंग परिधान करत धावताना दिसायला लागतं. अन् आपण ओळखायचं की, भीमाशंकर अगदी हाकेच्या अंतरावर आलंय. आतापर्यंत ऐश्वर्यसंपन्न असलेली पायवाट आता मात्र नकोशी वाटायला लागते. हे देणं केवळ आपल्यासारख्या कृतघ्न माणसाचंच.
वाटेत एक छोटेशे गणपती मंदिर दिसेल (साक्षी विनायक गणपती मंदिर) येथून पुढे सरळ चालत गेल्यास एक कि मी तुम्ही भीमाशंकर मंदिराच्या मागे येऊन पोहोचतात (भीमाशंकर मंदिरा जवळ SBI /Bank of Maharashtra ATM च्या येथे हा ट्रेक संपतो म्हणजे या ए टी एम पासून गावातून जो रस्ता गेला आहे तोच गुप्त भीमाशंकर कडे गेला आहे तेव्हा भीमाशंकर मंदिरा जवळ येऊन ज्यांना गुप्त भीमाशंकर बघायचे आहे त्यांनी गावात कोणालाच विचारू नये . गावातील लोक २००,३०० किंवा मनाला येईल ती किंमत घेऊन हे ठिकाण दाखवतात व फसवणूक करतात हे तुम्हाला नंतर लक्षात येईल. )ही उरलेली थोडीशी वाट कशीबशी पार करून भीमाशंकरच्या मंदिरासमोर यायचं. धुक्यात लपलेलं मंदिराचं शिखर बघून धन्य वाटतं. ही पायी निसर्गवारी पूर्ण झाल्याचं समाधानही वाटतं.
मंदिराचे बांधकाम अगदी भक्कम दगडाचे आहे. मंदिराच्या समोरच शनीच छोटसं मंदिर आहे. वरती चिमजी आप्पानी वसईहुन आणलेली घंटा बांधलेली आहे. त्याच्या बाजुलाच दीपमाळ आहे. अजुनही मंदिराच डागडुजीच काम चालू आहे.
भीमाशंकर स्थानाची महती ही येथल्या निसर्गातच दडलेली.. यासारख्याच अनेक ठिकाणी भगवान शंकराचं वास्तव्य असल्याचं आपण मानत असतो. तीन तासांच्या पायपिटीनंतर जेव्हा आपण मंदिराच्या भवतालच्या व्यावसायिक कोलाहलात येतो तेव्हा मात्र मनाला विषण्ण वाटतं. दर्शनाला आलेल्या बहुतेक भक्तांच्या बेजबाबदार वागण्यामुळे परिसरातल्या निसर्गाचं विद्रुपीकरण झाल्याचं वाईट वाटतं. येथली असलेली गर्दी ही शंकराच्या पिडी दर्शनासाठी धडपडत असल्याचं दिसतं.. परंतु आपल्यासारखे भटके मात्र निसर्गातच शंकराचं दर्शन घेऊन आलेले असतात..
मुख्य मंदिरापासून गुप्त भीमाशंकर १ कि.मी. अंतरावर आहे. यासाठी भीमा नदीच्या पात्रातून मार्ग आहे. भले मोठे खडक आणि या नदी पात्रातून चढण यामुळे हे अंतर चालणे देखील कठीण होते.शेवटी काही अंतर असे चालल्यावर नदीच्या पात्रातील मोठे खडक संपले आणि चढण संपून आपण पुन्हा घनदाट झाडीत येऊन पोहोचतो . नदीचे पात्र ओलांडून झाले कि ते आपल्या डावीकडे सोडून द्यावे आणि त्या घनदाट झाडीत प्रवेश करावा .
गुप्त भीमाशंकर :-
नदीचे पात्र डावीकडे सोडून दिल्यावर घनदाट अरण्यात प्रवेश करून साधारण एक कि मी चालावे. थोडीशी चढण आहे या वाटेवर .
एक कि मी चालल्यावर तुम्हाला डावीकडे खाली एका दगडावर पिवळ्या रंगाने बाणाची खुण केलेली दिसेल तेव्हा येथून मुख्य वाट सोडून डावीकडची वाट धरावी . येथून जरा जपून पुढे जपून जाणे कारण या टप्प्यात रान डुक्करे खूप आहेत आणि तुम्हाला त्याचा आवाज देखील येईल . या जंगलात वाट खाली जाते व पुन्हा नदी पात्राला मिळते.
येथून दाट झाडीत जावे येथेच तुम्हाला नदीच्या पात्रात एका मोठ्या दगडा खाली ३ शिवलिंग दिसतील.
या सर्व भटकंतीत तुम्ही शांतता राखली तर शेखरू या भल्या मोठ्या खारीचे दर्शन होईल .अशा रीतीने भोरगिरी ते भीमाशंकरची केलेली हि पायपीट सफल होते.
संदर्भ :-
१) www.trekshitiz.com हि वेबसाईट
२) www.durgbharari.in हि वेबसाईट
३) http://ontheedgeofsahyadris.blogspot.com/2013/05/bhorgiri-bhimashankar-trek.html
४) https://www.discovermh.com/bhorgiri-fort/
५) http://pkothavade.blogspot.com/2014/12/bhorgiri-to-bhimashankar-magical-trail.html
६) https://prahaar.in/
१) www.trekshitiz.com हि वेबसाईट
२) www.durgbharari.in हि वेबसाईट
३) http://ontheedgeofsahyadris.blogspot.com/2013/05/bhorgiri-bhimashankar-trek.html
४) https://www.discovermh.com/bhorgiri-fort/
५) http://pkothavade.blogspot.com/2014/12/bhorgiri-to-bhimashankar-magical-trail.html
६) https://prahaar.in/
![]() |
| The trek route from Bhorgiri towards Bhimashankar |
![]() |
| Below is the dry river bed of Bhima River.We descended down and went to Bhimashankar by the upstream route |
![]() |
| The forest route to Bhimashankar |
![]() |
| Dry river bed of Bhima River |
![]() |
| Walking through Dry Bhima river bed.Very big boulders while walking upstream |
![]() |
| Approaching Gupt Bhimashankar |
![]() |
| Route to Bhimashankar Temple |
![]() |
| Bhimashankar temple seen in front |
![]() |
| Reached near the temple |
![]() |
| Near Gupt Bhimashankar in dry river bed |


















.jpg)


.jpg)



.jpg)



.jpg)
















.jpg)

No comments:
Post a Comment