
जुन्नर हे भारतीय-रोमन व्यापारी काळात कोकण आणि देश यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून कल्याण-पैठण-तेर आणि भृगुकच्छ-पैठण-तेर या मुख्य व्यापारी मार्गावर स्थित होते. सातवाहन काळात पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईजवळील सोपारा या बंदरांत येत असून या मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीतून जुन्नर मार्गे देशावर होत असे. जुन्नर हे इसवी सन पुर्व सातवाहन कालखंडा पासूनच व्यापाराचे केंद्रस्थान होते ते जुन्नरला लाभलेल्या भौगोलिक रचनेमुळे. साधारण इसवी सनापूर्वी ५०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. प्रतिष्ठान [आताचे पैठण] ही सातवाहन राजांची राजधानी आणि जीर्णनगर [आताचे जुन्नर] ही उपराजधानी होती.
त्या काळी जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. मग नाणे घाट मार्गे ते घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत करत जात असत.सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा आणि सोपा मार्ग होता.त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती. हा व्यापार उदीम वाढत जावा, आपल्या प्रदेशाची अशीच भरभराट होत राहावी आणि नाणे घाट मार्गे जुन्नरच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारीमार्गाचे संरक्षण व्हावे आणि लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून त्या त्या वेळच्या राजवटींमध्ये भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, सिंदोळा यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली.

टिकाऊ खडकाचा प्रदेश म्हणून भारतातील सर्वात जास्त गिरिदुर्ग जुन्नरमध्ये निर्माण झाले. देशविदेशातून येणारे व्यापारी त्यांची संस्कृती पण सोबत घेऊन यायचे. जुन्नरमध्ये उत्खनन करत असताना त्यांना ग्रीक लोकांची देवता "युरोस"ची मूर्ती, चिनी भांडी, जुनी नाणी, सोन्याच्या मोहरा, शिलालेख असे खूप काही या भागामध्ये सापडले. येणारे व्यापारी मुक्त हस्ताने दान करत असत.त्यामुळे जुन्नर परिसरात प्रत्येक धर्माची, धर्मपीठाची भरभराट झाली.

१) मध्ययुगीन काळात लेण्याद्रीच्या बौद्ध लेण्यांमध्ये गिरिजात्मक गणपतीची स्थापना झाली.
२) पेशवे काळात जुन्नरजवळच्या ओझरच्या विघ्नहराचा जीर्णोद्धार झाला.
३) ओतूर येथे गुरु चैतन्य महाराजांनी वैष्णव पंथाचा ’रामकृष्ण हरी” हा मंत्र संत तुकारामांना दिला.
४) संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रेड्याला जुन्नर तालुक्यातल्या आळे गावी समाधी दिली.
५) पिंपळगाव जोगा धरणाजवळ खुबी गावात खिरेश्वर या पांडव कालीन मंदिराची निर्मिती झाली, खिरेश्वराच्या उत्तरेला हरिश्चंद्र गड आहे.
६) जुन्नरच्या किल्ले शिवनेरी किल्ल्यावर फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
७) पेशवे कालीन महालक्ष्मी मंदिर उंब्रज येथे आहे.कोल्हापूर महालक्ष्मीचे ते उपपीठ मानले जाते.
२) जुन्नर सह्याद्री पर्वत रांगेत बसल्यामुळे पश्चिमेकडील भाग हा डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील भाग हा मैदानी आहे.
३) याच सह्याद्रीच्या कुशीत निसर्ग सौंदर्याने नटलेला माळशेज घाट, नाणेघाट , दाऱ्या घाट , हरिशचंद्र गड, कोकणकडा आहे.
४) सातवाहन कालीन अनेक लेणी, त्याचे अवशेष, विहिरी या भागात आहेत.
५) माणिकडोह धरणाच्या पायथ्याला महाराष्ट्रातील एकमेव बिबट्या निवारण केंद्र आहे. १९९५साली जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण जुन्नर तालुक्यात खोडद या गावी उभारण्यात आली. जवळच आर्वीचे उपग्रह भूकेंद्रही आहे.
६) श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्या मुळे जुन्नर च नाव साखर क्षेत्रात आघाडीवर आहे. माजी खासदार स्व. निवृत्तिशेठ शेरकर, स्व. सोपानशेथ शेरकर यांनी स्थापन केलेल्या आणि श्री. सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्त्वाखाली या साखर कारखान्यामुळे येथील भूमिपुत्रांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.
कुकडी,मीना नद्यांचा उगम आणि ऐतिहासिक नाणेघाटसारखी अद्वितीय कलाकृती या आणि अशा अनेक गोष्टी या परिसरात खूप मोठय़ा संख्येने आहेत.
जुन्नर म्हणजे किल्ले शिवनेरी, लेण्याद्री, ओझर हे समीकरण मराठी माणसाच्या मनात अगदी पक्के आहे. परंतु याशिवायही अनेक गोष्टींनी हा परिसर संपन्न आहे, वैविध्यपूर्ण आहे. म्हणूनच तो ट्रेकर्स, पर्यटक,पक्षी निरीक्षक आणि पुरातत्त्वविद्यच्या अभ्यासकांना कायमच खुणावत असतो.
जुन्नरचा उल्लेख थेट इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून मिळतो. जीर्ण नगर या नावाने ज्ञात असलेल्या या ठिकाणाचा संबंध सातवाहन कुलापर्यंत जातो. पश्चिम भारतातील या संपन्न राजकुलाने ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ अशी बिरुदावली मिरवली होती. याच कुळातील राणी नागनिका हिने नालासोपारा ते पैठण या प्रसिद्ध व्यापारी मार्गावरची वाहतूक होणाऱ्या याच नाणेघाटात एक लेणे खोदून काढले व त्यात एक ऐतिहासिक लेख कोरला आहे. अशी अद्वितीय कलाकृती अन्यत्र क्वचितच आढळेल.
मधमाशा मोठय़ा प्रमाणावर असल्याने तेथे जाणे धोकादायक आहे. सुमारे १४ लाख वर्षांपूर्वी इंडोनेशियातील टोबो नावाच्या ज्वालामुखीच्या बाहेर पडलेली राख (टेफ्रा),नारायणगाव नजीकच्या बोरी गावात येऊन पडलीये. नदीपात्राच्या कडेला या राखेचे थर पाहायला मिळतात. बोरी गावाला जातानाच वाटेत खोडद येथील महाकाय रेडिओ दुर्बिणी लक्ष वेधून घेतात.प्राचीन काळ ते आधुनिक वैज्ञानिक युग यांचा सुरेल संगम आपल्याला जुन्नर परिसरात पाहता येतो. आळे गावातील ज्ञानेश्वरांच्या रेडय़ाची समाधी,नारायणगावचा किल्ला आणि शँपेन प्रकल्प, पावसाळ्यातील रमणीय माळशेज घाट, खिरेश्वर आणि हरिश्चंद्रगड,या आणि अशा अनेक गोष्टींनी समृद्ध परिसर आपली वाट पाहतो आहे.
चार दिवस बाजूला काढून आणि नारायणगाव व जुन्नर ही ठिकाणे केंद्रस्थानी ठेवून आपण या परिसराची मनसोक्त भटकंती करु शकतो. एक दिवस नारायणगाव, आळेफाटा, माळशेज हा परिसर पाहायचा. दुसऱ्या दिवशी जुन्नर शहर, शिवनेरी,लेण्याद्री आणि पुढचे दोन दिवस कुकडेश्वर, जीवधन, नाणेघाट आणि हडसर, चावंड,हटकेश्वरसाठी ठेवायचे,असा कार्यक्रम ठरवता येईल. नुसते जुन्नर शहर पहायचे झाले तरीसुद्धा एक दिवस कमी पडेल इतक्या वैशिष्टय़पूर्ण गोष्टी या नगरात आहेत. पैकी एक शिल्प महत्वाचे आहे.शिवपूर्वकालीन राजवटीमधील ऐतिहासिक खुणांमध्ये महत्वाचे असलेले हे शिल्प, सदर बाजारातील वेशीनजिकच्या दक्षिणेकडील बुरुजावर आहे. तर एका छोटय़ा दगडावरील द्वारशिल्प आहे. एक हत्ती, त्यामागे एक शुक (पोपट) आणि त्यामागे तोंडात तारा धरलेला वाघ आहे. फारच अर्थपूर्ण शिल्प आहे हे. याचा अर्थ असा- ‘या प्राचीन नगरातील सत्ताधीशांकडे गजांतलक्ष्मी आहे, शुकासारखी विद्वत्ता आणि वैराग् आहे, वाघासारखे पराक्रमी शूर सनिक आहेत अवघ्या जगाला प्रकाश देण्याचं सामर्थ्य आहे.’ शिवनेरीवर जन्मलेल्या शिवराजांच्या राज्यात हे सगळंच होतं, फक्त हे जुन्नर शहर आणि राजांचे जन्मस्थान शिवनेरी मात्र दुर्दैवाने नव्हते हीच एक खंत !
आजही वापरत असलेला मलिक अंबर नहर या गोष्टीही पाहण्याजोग्या. जुन्नरर्भोवती पद्मावती, भातखळा ,कुंभार, आणि बादशहा असे चार तलाव बांधले गेले होते. तांदूळ, कांदा व फूलशेती यांनी समृद्ध असा हा प्रदेश आहे. संपूर्णपणे शाकाहारी, पण नाव मात्र मासवडी असलेला अतिशय चविष्ट पदार्थ आवर्जून खावा असा आहे.कोणत्याही ऋतूमध्ये हा परिसर रमणीयच आहे.ऐन पावसाळ्यामध्ये हा सगळाच परिसर पाण्याने सचैल न्हाऊन निघतो. नजर जाईल तिकडे हिरवाई पसरलेली असते अनेक रानफुले फुललेली दिसतात. काळेकभिन्न कातळकडे आणि त्यांच्या अंगाखांद्यावर पसरलेली ही हिरवीगार नक्षी अक्षरश डोळ्याचे पारणे फेडते. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण या ठिकाणी पाहायला मिळते.नद्या ओसंडून वाहत असतात, काळे मेघ जमिनीला टेकायला आलेले असतात, खाचरांमध्ये भात रोपांची लागवड चालू असते,आणि य सगळ्याला पार्श्वभूमी अती भारदस्त किल्ल्यांची किंवा जबरदस्त कातळकडय़ांची ! निसर्गाचे एवढे मनमोहक रूप पाहण्यासाठी फार लांब जाण्याची गरज नाही. एक दिवसाची किंवा तीन चार दिवसांची, जसा वेळ उपलब्ध आहे तशी भटकंती करायला जुन्नर परिसरासारखे दुसरे ठिकाण नाही.गरज आहे ती बाहेर पडायची आणि इथे मनसोक्त भटकायची. पुण्या-मुंबईला एवढा जवळअसूनही काहीसा दुर्लक्षित राहिलेला जुन्नर परिसर आपल्याला खुणावतो आहे.
प्रसिद्ध पर्यटन स्थळे:
1) किल्ले शिवनेरी- (जुन्नर )
2) किल्ले नारायणगड - (खोडद)
3) किल्ले चावंड -( चावंड गाव)
4) किल्ले जिवधन -( घाटघर )
5) किल्ले निमगिरी -(निमगिरी गाव)
6) किल्ले हडसर - (हडसर गाव)
7) किल्ले सिंदोळा -(मढ, पारगाव )
ब) लेणी समुह कोणते व कोठे आढळून येतात:- भारतातील जुन्नर तालुका एकमेव असा तालुका आहे की येथे सर्वाधिक 260 लेण्या पहावयास मिळतात.
1) अंबा अंबिका लेणी (खोरे वस्ती जुन्नर )
2) शिवनेरी किल्ला लेणी (जुन्नर )
3) तुळजाभवानी लेणी (पाडळी)
4) लेण्याद्री विनायक लेणी( लेण्याद्री )
5) सुलेमान लेणी ( लेण्याद्री )
6) चावंड लेणी (चावंड गाव)
7) हडसर लेणी ( हडसर गाव)
8) निमगिरी लेणी ( निमगिरी गाव)
9) प्रसिद्ध नाणेघाट लेणी ( घाटघर)
क) तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरे:-
1) अष्टविनायक मंदिरे:-
i) गिरीजात्मक - लेण्याद्री
ii) विघ्नेश्वर - ओझर
2) हेमाडपंथी बांधणीतील कोरीव पुरातन मंदिरे :-
i) नागेश्वर मंदिर - खिरेश्वर
ii) कुकडेश्वर मंदिर - कुकडेश्वर
iii) अर्ध पीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर - पारूंडे
3) संत समाधी मंदिर :-
i) संत ज्ञानेश्वर वेद प्रणित रेडा समाधी- आळे
ii) संत रामदास स्वामी समाधी - आणे
iii)चैतन्य महाराज समाधी - ओतुर
4) इतर महत्वाची मंदिरे:-
i) पंचलींग मंदिर - जुन्नर
ii) पाताळेश्वर मंदिर - जुन्नर
iii) उत्तरेश्वर मंदिर - जुन्नर
iv) खंडोबा मंदिर - वडज
v) रेणुका माता मंदिर -निमगिरी
vi)गुप्त विठोबा प्रति पंढरपूर मंदिर, - बांगरवाडी
viii) वरसुबाई माता मंदिर - सुकाळवेढे
ix) दुर्गादेवी मंदिर - दुर्गवाडी
x) कपर्दिकेश्वर मंदिर - ओतुर
xi) जगदंबा माता मंदिर - खोडद
5) निसर्गच्छादित निसर्गमय मंदिर - हटकेश्वर
ड ) प्रसिध्द निसर्ग रम्य घाट :-
i) पुरातन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट - घाटघर
ii) माळशेज घाट - कल्याण - मुंबई महामार्ग
iii)दार्याघाट - आंबोली
iv) आणेघाट - आणे
v) लागाचा घाट
vi) म्हसवंडी घाट
vii)इंगळुन घाट
viii)हिवरे मिन्हेर घाट
ई) प्रसिद्ध धबधबे :-
i) आंबोली
ii) नाणेघाट
iii)माळशेज
iv)इंगळुन
v) हातवीज
vi)दुर्गादेवी
उ) प्रसिद्ध नद्या.
i) मीना नदी व उगमस्थान आंबोली
ii) कुकडी नदी व उगमस्थान कुकडेश्वर
iii) पुष्पावती नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
iv) काळू नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
v) मांडवी नदी व उगमस्थान
ए) प्रसिद्ध धरणे:-
i) येडगाव धरण - कुकडी नदी
ii)वडज धरण - मीना नदी
iii)माणिकडोह धरण - कुकडी नदी
iii)पिंपळगाव जोगा धरण - पुष्पावती नदी
iv)चिल्हेवाडी धरण - मांडवी नदी
ओ) प्रसिध्द खिंडी
i) गणेश खिंड
ii)मढ खिंड
iii)टोलार खिंड
iv)आळे खिंड
ऑ) ऐतिहासिक वास्तू :-
i) सौदागर हाबसी घुमट - हापुसबाग
ii) 300 वर्षे जूना मलिकांबर बाराबावडी
पाणीपुरवठा योजना जुन्नर शहर.
iii) नवाब गढी - बेल्हे
iv) गिप्सन निवास व समाधी.
औ ) जागतीक केंद्र :-
i) जागतिक महादुर्बिण - खोडद
ii) विक्रम दळणवळण उपग्रह - आर्वी
प) पठार :-
i) आंबे हातवीज पठार
ii) नळावणे पठार
iii) कोपरा मांडवे पठार
फ) गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फुट खोल असलेले कोकणकडे.
i) नाणेघाट
ii) माळशेज
iii)दार्याघाट
iv)ढाकोबा
v) दुर्गादेवी
ग) प्रसिध्द रांजण खाचखळगे:-
i) माणिकडोह गावातील कुकडी नदीवर
ii) निघोज
घ ) पाच हजारांहून अधिक वर्षापुर्वी भुकंप झालेल्या उद्रेकाची राख आजही पहावयास मिळते - बोरी गाव
ड ) नैसर्गिक पुल
i) आणे घाटातील नैसर्गिक पुल
ii) हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पुल.
ढ ) प्रसिद्ध विहिरी :
बारव बावडी-जुन्नर
पुंदल बावडी-जुन्नर
आमडेकर विहीर-पाडळी
न ) जुन्नर तालुक्यातील दगड घंटेसारखे वाजतात.
आंबे गावच्या पश्चिमेस २०० मीटरवर
दुर्गादेवी किल्ल्याच्या टॉपवर
भौगोलिक दृष्ट्या जुन्नर हे सपाट विस्तीर्ण क्षेत्र असून सह्यादी पर्वतरांगेपासून २५ किमी. पूर्वेस आहे. कुकडी, मीना आणि पुषावती या तीन प्रमुख नद्या असून पांढरीचे टेकाड कुकडी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. जुन्नर येथील पांढरीचे टेकाड क्षेत्र साधारणतः २० हेक्टर क्षेत्रांत पसरलेले आहे. या प्राचीन स्थळाचे सर्वप्रथम उत्खनन महाराष्ट्र शासनाच्या, पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने १९८४ मध्ये करण्यात आले. तदनंतर २००५ ते २००८ या तीन सत्रांत डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे येथील पुरातत्त्वज्ञांनी उत्खनन केले.
या उत्खननामध्ये सर्वांत खाली सातवाहन-पूर्व काळात वस्ती असल्याचे संकेत मिळाले आहेत. जुन्नर या स्थळाचा सर्वांगीण विकास सातवाहन काळातील स्तरामध्ये दिसून येतो. या कालखंडाला दोन टप्प्यांत विभाजित केले आहे. जुन्नरच्या वरच्या स्तरांत मध्ययुगीन ते मराठा काळाचे पुरावे मिळाले आहेत. परंतु वर्तमान काळातील मानवी वस्ती आणि इतर खोदकामांमुळे या स्तरांचे अवशेष जवळपास नष्ट झाले आहेत.
उत्खननात सातवाहन काळातील घरांचे आणि वर्तुळाकार विहिरींचे अवशेष मिळाले आहेत. घरबांधणीकरिता भाजल्या विटांच्या उपयोग होत असून भिंतीवर मातीचा गिलावा केला जात असे. घराच्या आतील जमीन चुना आणि मातीने सारवून तयार केल्या जात असत. सातवाहन काळातील खापरे आणि पुरावशेषांच्या आधारे हा कालखंड इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. दुसरे शतक इतका निर्धारित केला आहे. उत्खननात प्राप्त अंफोरा प्रकारची, हिरव्या रंगाची चकाकी असलेली आणि चिनी खापरांवरून जुन्नरचे यूरोपातील रोम, फारसचे आखात आणि चीनसोबत व्यापारिक संबंध असल्याचे सिद्ध झाले आहे.
जुन्नर परिसरातील सातवाहन कालीन घराची बांधनी पक्की होती. घर बाधकामातील विटा एकावर एक जोड येणार नाहीत अशा पध्दतीने ठेवलेल्या असत. बाधकामातील खालच्या विटा आडव्या तर वरच्या विटा उभ्या ह्या पध्दतीने असल्याने घरांची बांधनी भक्कम असायची.बाधकामातील विटा आकाराने खुप मोठ्या म्हणजे साधारणपणे २१ इंच लांब, ११ इंच रुंद ,३ इंच जाडीच्या होत्या.
जुन्नर परिसरातील गोळेगांव, उदापुर, कुसूर,पाडळी, जुन्नर ,सुसरबाग,डिगोंरे,निरगुडे येथील सातवाहन कालीन घरांची छप्परे भिंतीत आणि जमिनीत लाकडे वासे पुरुन त्यावर आडव्या लगी ( लाकडी वासे ) टाकून तयार केली जात. आणि त्यावर एका विशिष्ट प्रकारची भाजलेल्या मातीची कौले ठेवीत असत. ति कौले साधारणपणे आयत आकाराची असून त्यांना वरच्या भागास पन्हाळ्या केलेल्या दिसून येतात. सातवाहन काळात जुन्नर परिसरात भरपूर पाऊस पडत असावा .पावसाचे पाणी झटकन निघून जाता यावे म्हणून ही व्यवस्था कौलाना केलेली असायची.
जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील घराच्या कौलांना वरच्या अंगास दोन छिंद्रे असून त्यांतून ती झाडाच्या वेलानी किंव्हा खिळ्यांनी लगीवर ( लाकडी वासे ) बाधीत किव्हा ठोकून बसवीत .कौलांना दिलेला उतार तसेच त्यांवर काढलेल्या पन्हाळी यावरुन जुन्नर परिसरात सध्या पडत असलेल्या पावसाच्या मानापेक्षा जास्त पाऊस सातवाहन काळात पडत असावा असे सिध्द होते.
अशा विशिष्ट प्रकारची भाजलेल्या मातीची कौले नाशिक, कोल्हापूर, तेर, नालासोपारा, नेवासे, पैठण आदि ठिकाणी संशोधकांना - सातवाहन कालीन इतिहास अभ्यासकाना सातवाहन कालीन वस्तीस्थळाच्या भागात पाहायला मिळाली. लेण्याद्री जवळील गोळेगांव मध्ये सातवाहन कालीन लोकवस्ती चे अवशेष आजही दिसून येतात. जुन्नर परिसरातील असंख्य लेण्यांत जे शेकडो बुध्द भिक्षु निवास ( वर्षावास) करीत असतील ,त्याच्या भिक्षेसाठी, निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या वस्त्या या प्राचीन जुन्नर परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात.
---- बापुजी ताम्हाणे, गोळेगांव - लेण्याद्री ( जुन्नर)
( प्राचीन इतिहासाचे अभ्यासक )
मों. नं. 9730862068
किल्ले जुन्नर अर्थात जुन्नरचा भुईकोट
जुन्नर हे पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण.कुकडी नदीच्या तीरावर डोंगरांनी वेढलेल्या परिसरात वसलेले आहे.इथल्या डोंगररांगेत माळशेज घाट, नाणेघाट व दाऱ्याघाट या प्रमुख घाटवाटा आहेत.सातवाहन काळात कल्याण-नाणेघाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्या काळी जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. पुढे नाणेघाट मार्गे घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत जात असत. व्यापारपेठेला आणी मूळ शहराला संरक्षण देण्यासाठी जुन्नरचा गढीवजा नगरकोट बांधला गेला.अस्तित्वात असलेला किल्ले जुन्नर भुईकोट हा मध्ययुगीन काळात अस्तित्वात आला.जुन्नर एसटी स्थानकासमोरच जुन्नर भुईकोट असून लोकांना फारसा माहित नाही. स्थानिक लोकांत हा भुईकोट दादोजी कोंडदेव वाडा म्हणुन प्रचलीत आहे.
साधारण आयताकृती आकाराचा हा किल्ला १२ एकरवर पसरलेला असुन किल्ल्यातील शासकीय कचेऱ्या, न्यायालय, दुकाने यांच्या अतिक्रमणात किल्ल्याचे अस्तीत्व नष्ट झाले आहे. या भुईकोटाला एकुण तेरा बुरूज असुन तटबंदीत अकरा व मुख्य दरवाजाशेजारी दोन अशी त्यांची रचना आहे. किल्ल्याची तीन बाजुची तटबंदी पुर्णपणे ढासळलेली असुन केवळ एका बाजुची तटबंदी पुर्णपणे शिल्लक आहे. असे असले तरी कोटाचे सर्व म्हणजे तेराही बुरूज आजही पहायला मिळतात. पुर्वाभिमुख दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाची चौकट आजही शिल्लक आहे. या भागात शासकीय कचेऱ्या असल्याने छायाचित्रणास मनाई आहे. या भागात दोन प्राचीन विहिरी असुन आत प्रवेशास मनाई आहे. कोटाच्या बाहेरून फेरी मारताना एक शरभशिल्प दिसुन येते. या तटबंदीची उंची वीस फुट असुन खालील दहा फुट बांधकाम दगडात व वरील दहा फुट बांधकाम विटांनी केलेले दिसते. बुरुजांचे बांधकाम देखील असेच केलेले असुन.शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आले असता या किल्ल्याला अवश्य भेट द्यायला हवी.
जुन्नरची आश्चर्यकारक पाणीपुरवठा योजना :-
आफ्रिकेतून गुलाम म्हणून भारतात येताना मलिक अंबर इराण मधून आला होता आणि इराण मधील “क्यानोत” हि जलव्यवस्थापन यंत्रणा त्याला माहित होती. त्याने त्याच पद्धतीचा येथे अवलंब करायचे ठरवले. इराण देशात सुद्धा पाण्याचे दुर्भिक्ष आहे. परंतु तरी सुद्धा तुम्हाला इराण मध्ये सर्वत्र उत्कृष्ट बागा, कारंजे यांची रेलचेल दिसते. बऱ्यापैकी दुष्काळी आणि जवळ जवळ वाळवंट असणाऱ्या प्रदेशातील हा चमत्कार म्हणजे ‘क्यानोत’
क्यानोत म्हणजे काय? आणि ते कसे ? बनवले जातात ? ज्यावेळी पावसाळ्यात पाउस पडतो त्यावेळी डोंगर रांगांच्या मध्ये एक जल साठवण विहीर तयार केली जाते. विहिरीची खोली ५०० फुट किंवा त्यापेक्षा अधिक सुद्धा असते. अर्थात जमिनीच्या प्रतीनुसार आणि पाण्याची लागणारी गरज यावर विहिरीची खोली ठरते.त्या विहिरीचे तोंड हे शंखाकृती ठेवले जाते कि ज्यामुळे सूर्यप्रकाश आत पोचू शकत नाही. कोणताही डोंगर अथवा पर्वतीय भागात नैसर्गिकरित्या उंचावर एक सपाट भाग तयार झालेला असतो. की जो डोंगर विहीर तयार करण्यासाठी निवडला जातो. त्याच्या पुढे अजून उंच डोंगरांची रांग असल्याची खात्री केली जाते.. त्या डोंगर रांगेवरील पाणी चर खणून या विहिरीपर्यंत पोचवले जाते. या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये आणि पाण्यासह धूप झालेली माती विहिरीत जाऊ नये म्हणून सभोवताली असणार्या डोंगररांगावर झाडे लावून तो भाग हिरवीगार केला जातो. झाडे आणि गवत जमिनीची धूप होऊ देत नाही आणि फक्त पाणीच विहिरीपरेंत वाहात येते. या पावसाच्या पाण्याने ती विहीर तुडुंब भरतेआता विहिरीचा परीघ अन खोली हि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा करायचा आहे तेथील दैनंदिन गरज लक्षात घेऊन सुमारे दीड वर्ष पाणी पुरवठा होऊ शकेल या पद्धतीने बनवली जाते. या विहिरीतील खाली तळाशी काही भाग हा डेड स्टोक म्हणून सोडला जातो कि ज्यामध्ये वाहून आलेल्या पाण्यातील गाळ साठून राहतो आणि फक्त स्वच्ह पाणीच पुढे प्रवाहित होऊ शकते. आता डोंगरापासून खंदकापर्यंत एक सरळ रेषा लक्षात घेऊन प्रत्येकी २०० फुट ( ६० मीटर ) अंतरावर खोल खड्डे ( विहिरीपर्यंत कमी परिघाच्या ) तयार केले जातात. आता मुख्य विहीर आणि या छोट्या रांगेतील विहिरी एक मेकांना जोडण्यासाठी आत एक बीळ तयार केले जाते. त्या बिळाच्या वरच्या भागात आर्च म्हणजेच मातीच्या भाजून तयार केलेल्या कमानी बसवल्या जातात. या कमानी मातीचा दाब सहन करतात आणि पाण्यात माती मिसळू देत नाहीत. परंतु पृष्ठभाग मात्र मातीचाच असतो त्यामुळे या बिळातून सुद्धा जमिनीत पाणी झिरपत राहते आणि जमिनीखालील पाण्याचा स्तर सुद्धा राखला जातो. आता हि २०० फुटावर असणारी जी छोटी विहीर आहे तिच्या बरोबर खाली सुद्धा डेड स्टोक तयार करतात म्हणजे प्रत्येक ठिकाणी २०० फुट अंतरावर पाण्यातील गाळ साठला जातो आणि पुढे अधिकाधिक शुद्ध पाणी प्रवाहित होत राहते. आता हि यंत्रणा खेड्यापर्यंत आली कि त्याचे मुख उघडले जाते. आता मुखाचे तोंड हे साधारण २४ तास पाणी वाहत राहील आणि एका दिवसाची गरज भागेल इतके मोठे असते त्यामुळे वर्षभर त्या खेड्याला पाणी पुरवठा होत राहतो. त्यामुळे तुम्ही खेडे वगळता इराण मध्ये फिरलात तर तुम्हाला वाळवंटच दिसणार पण खेड्यात मात्र वापरासाठी मुबलक पाणी आणि शेतीसाठीसूध्दा एवढच काय मस्त बागा आणि कारंजे सुद्धा. हि अफलातून पद्धत सुमारे ४०० -४५० वर्षापूर्वी सुरु झाली आणि त्या काळात बांधलेले क्यानोत अजून सुद्धा उत्तम काम करत आहेत. नवीन क्यानोत बनवण्याची इराण मध्ये गरज पडत नाही फक्त जे आहेत त्या क्यानोत ची देखभाल केली जाते. डोंगरातील पाणी सायफन च्या तत्वाने खेड्यात येते वर्षभर पुरते. वीज किंवा कशाची सुद्धा गरज नाही.
मलिक अंबर ने हेच तंत्रज्ञान वापरून औरंगाबाद मध्ये पाणीपुरवठा योजना अंमलात आणली. व पुढे त्या जुन्नर मध्ये बाजारपेठ व मार्ग म्हणून पाठविण्यात आले. त्याने जुन्नर शहरात बाराबावडीची संकल्पना अमलात आणली व जुन्नर शहरात बावन्न चावडी व बावन्न पेठांची निर्मिती करून मलिक अंबर पाणी पुरवठा योजना आमलात आणली. कि जीचा र्हास झालेला निदर्शनास येतो. मलिक अंबरने या बाराबावडीच्या विहीरीतुन पाणीपुरवठा योजनेस दगडी कोरीव शिल्पांचा केलेला वापर म्हणजे एक आश्चर्यच आहे.जवळपास तीस फूट खोल विहिरीत खडकाला तीन होल पाडून मध्ये दोन ते तीन फुट अंतर सोडुन पुन्हा एका दगडाला वरील बाजूस विटेच्या आकाराचे एवढे होल केले आहे. व त्याच दगडाला एकाखाली एक असे तीन होल केले आहेत. त्यानंतर तीसफूट खोल जमीनीखालुन सहा फुट उंच घडीव दगडात बांधीव पाईपलाईन उच्छ्वास काढून तयार केले व ती पाईपलाईन पुन्हा दुसर्या विहीरीत दगडी फिल्टर बसवून सोडले आहे कि ज्यायोगे पाणी शुद्धीकरण होऊन ते पुन्हा शहरातील दगडी पाईपलाईनला सोडले जाई. आपण बांधलेल्या धरणांसाठी ७०० कोटी सरकार खर्च करू शकते. पण या अभियांत्रिकी चमत्काराला जिवंत ठेवण्यासाठी आणि सतत पाणी मिळवण्यासाठी काही लाख रुपये दर वर्षी देखभाल दुरुस्तीला खर्च करू शकत नाही हे लज्जास्पद आहे. जुन्नरला निर्जळी घडते व पावसाळ्यात सर्रास गढूळपाणी फिल्टर अभावी पीण्यासाठी नळांना येत असते. परंतु आज सुध्दा “क्यानोत” ४०० वर्षांच्या पूर्वी बांधलेली असून सुद्धा फुकटात काम करते. परंतु आज आपण बाराबावडी सारख्या अनमोल ठेव्याला नष्ट होताना पाहत बसलो आहोत. दुर्दैवाने सामान्य माणूस तर निसर्गापासून कायमचा तुटला आहे त्याला या अनमोल ठेव्याची काहीच किंमत राहीलेली नाही.
हा लेख जलयुक्त शिवार या संकल्पनेकरीता खुपच महत्त्वाचा आहे कि ज्यायोगे आपणास थोडीफार मदत होईल.
मी येथे जुन्नर शहरातील बाराबावडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी शुद्धीकरणाच्या पध्दतीची काही छायाचित्रे देत आहे.
लेखक / छायाचित्रे -श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद )
जुन्नरचा तालिमखाना :-
आज या ठिकाणच्या वास्तव्यावर पांघरून घालुन अक्षरशः येथील इतिहास हद्दपार केलेला पहावयास मिळतो. या वास्तूस अगदी बोटावर मोजता येतील एवढ्याच व्यक्ती “दादोजी कोंडदेव “वाडा होता असे संबोधतात. वास्तविक पाहता येथील काही मी पाहिलेले पुरावे वेगळेपण सांगू पहातात. तसा विचार केला तर संपूर्ण जुन्नर शहराला त्यावेळी तटबंदी होती. व हा संपूर्ण परीसरच एक भुईकोट किल्याच्या स्वरूपात होता. या किल्याच्या आत प्रवेश करण्यासाठी 21 प्रवेद्वार असावेत असे मला वाटते. येथे मला वाद घालायचे नाहीत मला तसे भासले म्हणून मी हा मुद्दा उपस्थित केला आहे.यामध्ये मला येथे असलेली दोन प्रवेद्वार दिसतात.त्यापैकि कचेरीत पुर्वेकडून आपण आत मध्ये प्रवेश करतो ते द्वार व जुन्या एस टी स्टॅन्ड कडून शहरात आतमध्ये प्रवेश करतो ते गंडभेरूड शिल्प असलेले पणसुंबापेठेतील द्वार. या व्यतिरिक्त नामशेष झाली ती मानवाच्या लोभापायी अन्य प्रवेद्वारे.
किल्ले शिवनेरीवर असलेल्या सरकार वाड्याच्या खापर पाईपलाईनशी अगदी मिळतीजुळतीच आहे. व सरकारवाड्याच्या दक्षिणेला अंघोळीसाठी पाणी तापवण्याची तेही पाणी पाईपलाईनच्या संपर्कातूनच याचे चांगल्या उदाहरणाचा उ त्तम नमुना या तालिमखाण्यात पहावयास मिळतो. आतील चुना व रेखाचित्रे एक पाहणारा वेगळाच भास निर्माण करतात. अशा वास्तुचे वास्तव्य कचेरीच्या ठिक पाठीमागे पश्चिमेस व भुईकोट किल्याच्या पश्चिमेकडील दक्षिण कोपर्यात पहावयास मिळते.
सौदागर घुमट किंवा हबशी मुंबज
जुन्नर तालुक्याचा ताजमहाल म्हणजेच हापूसबागचा हबशी घुमट.
हबशी महल- हापुसबाग, जुन्नर…
नवाब गढी बेल्हे ( जुन्नर) :-
अपरिचित गढी - अळकुटी
| अळकुटी गढी |
| अळकुटी गढी |
| गवाक्ष |
| फांजी आणि प्रवेशद्वारावरील बांधकाम |
| तटबंदी |
| जंग्या |
| ध्वजस्तंभ उभारण्याची जागा |
इतर तीन बुरुजांच्या आतील भागाची खूप पडझड झालेली असून पाय-या आणि वरील मजल्याचे वेगळे अस्तित्व नाहीसे झाले आहे. गढीच्या आतील दुमजली चौसोपी वाडा आज अस्तित्वात नाही. वाड्याची काही जोती पहावयास मिळतात. त्यावरील एक सोपा जेमतेम उभा आहे. बाजूलाच बारमाही पाणी असलेली विहीर आहे. वाड्यातील भुयार, दालने, नक्षीकाम असलेले खांब, सिंहासन अशा अनेक गोष्टी काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत.
| बुरुज |
गढी शेजारीच महादेवाचे मंदिर सरदार कदमबांडे यांनी बांधून घेतले. त्यात देवनागरीत खालीलप्रमाणे शिलालेख आहे -
कमळाजी
सुत रघोजी कदमराव पाटिल
मोकदम मौजे आमरापूर
उर्फ आवळकंठी
प्रगणे कर्डे सरकार जुन्नर सके १६७२
श्री मुखनाम संवत्सरे
मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा र _ _ _ _ _ _ _ _ _ शुभं भवतु "
असे हे वैभवशाली इतिहास लाभलेले अळकुटी ; गड - किल्ले, ऐतिहासिक वास्तू पाहणा-यांनाही परिचित नाही. एक दिवसात अळकुटीसोबत लोणी मावळा येथील तटबंदी, प्रवेशद्वार तसेच वडगाव दर्या गुहेतील देवीच्या मंदिरातील ‘लवण-स्तंभ’ , निघोज येथील रांजणखळगे ही ठिकाणे देखील पहाता येऊ शकतात.
ऐतिहासिक गढी दावडी (ता.खेड जि.पुणे)
डॉ. अलेक्झांडर गिब्सन : दी फरगॉटन फर्स्ट फॉरेस्ट कन्झर्वर ऑफ इंडिया !
- विठ्ठल पांडे, श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर, बेल्हे, जुन्नर, पुणे.जुन्नर- ओझर रस्त्यावर येडगाव धरणाच्या जलाशयाच्या काठावरचं निर्जन ठिकाण. वर निमुळतं टोकंच दिसेल असा कुणीतरी अज्ञाताने बांधलेला दगडी पँगोडा तुमचं लांबून लक्ष वेधून घेतो. दाट झाडीतून रस्ता काढत आणि गुंता झालेल्या वेली बाजूला सारत तुम्ही त्या दगडी स्तंभाजवळ पोहोचता.
" भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून दिनांक २२ मार्च १८४७ रोजी यांची नेमणूक झाली. भारतातील वनशास्राचा मूलभूत पाया रोवून त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावली. वनस्पती शास्रज्ञ व वन शास्रज्ञ या नात्याने त्यांची कारकिर्द भारतीय वनशास्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यायोग्य आहे. "
हा मजकूर कोरलेला आहे त्या दगडी स्तंभावर... डॉ.अलेक्झांडर गिब्सनच्या सन्मानार्थ ! जवळच गिब्सनच्या लेझी, हेक्टर आणि टिपू या तीन पाळीव कुत्र्यांच्या दगडी समाध्याही आढळतात. त्यावर इ.स. १८४६ सालाची नोंद आहे.जिथं बसून गिब्सन तुफान पावसाळ्यांच्या रात्री कंदीलाच्या मंद प्रकाशात 'फॉरेस्ट'आणि 'गार्डन रिपोर्ट' लिहित असे तो गिब्सनचा बंग्लो तसेच ज्या घोड्यावर बसून तो दररोज आठ मैल रपेट मारून 'फॉरेस्ट इन्सपेक्शन' करत असे त्या घोड्याचा तबेला आजही सुस्थितीत दिसून येतो. गिब्सनने दोनशे वर्षांपूर्वी लावलेला दुर्मिळ महोगनी वृक्ष आजही दिमाखात उभा आहे. गिब्सन आणि जे.इ. स्टॉक्सने बांधलेल्या छोट्या धरणाच्या अस्तित्वखुणा पाहायला मिळतात.
मुळात इ. स. १८०० मध्ये स्कॉटलंड मध्ये जन्मलेली व्यक्ती भारतातील जुन्नर तालुक्यातील हिवरे नावाच्या या आडवळणावरील गावात पोहोचलीच कशी ? तिथं या व्यक्तीने त्या काळी'बॉटनिकल गार्डन' कशी उभारली असेल ? ही व्यक्ती स्कॉटलंड मध्ये जन्मूनही स्थानिकांशी मराठीतून संवाद साधायची किमया कशी साध्य करू शकली ? आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग करून गावकऱ्यांना निःशुल्क वैद्यकीय सेवा कशी पुरवली असेल ? साबुदाणा, बटाटा, ऊस अशा पिकांवर प्रयोग करून इथल्या शेतकऱ्यांना त्याचा परिचय कसा करुन दिला ? या व्यक्तीत अशी कोणती जादू होती की रात्री बंगल्यावर दरोडा पडला असता आजूबाजूच्या गावातील सगळे रहिवाशी त्याच्या मदतीला धावून आले ? छत्रपती शिवराय आणि कान्होजी आंग्रेंच्या वननितीचा अभ्यास या व्यक्तिला का करावासा वाटला असेल ? असे अनेक प्रश्न सहज कुणालाही पडू शकतात. आणि त्यातूनच उलगडत जातो डॉ. अलेक्झांडर गिब्सनचा नाट्यमय जीवन प्रवास....
अलेक्झांडरचा जन्म २४ ऑक्टोबर १८०० साली लॉरेन्सर्क ( स्कॉटलंड ) येथे झाला. लहानपणीच अलेक्झांडर वडीलांकडून धार्मिक सहिष्णुता, निसर्गप्रेम आणि प्रगतीशील शेतीचे कौशल्य शिकला. माँट्रोज अकॅडमीत अँबरडीन मधल्या मँरिशस कॉलेजमध्ये लँटिन, ग्रीक आणि प्राकृतिक इतिहास यांचं शिक्षण घेतलं.एडिंबरा इथल्या विद्यापीठात अलेक्झांडरने 'मटेरिया मेडिका' शरीरशास्र व वनस्पतीशास्र यांचं अध्ययन केलं.
इ.स.१८२५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं ब्रह्मदेशात डॉ. गिब्सन यांची ' फ्लॅग सर्जन' म्हणून नियुक्त केली. उत्कृष्ट सेवेसाठी गिब्सन यांना ब्रह्मदेशात 'अवा पदक' देण्यात आले. इ.स.१८२७ मध्ये 'ट्रूप्स ऑफ बाँबे हॉर्स, आर्टिलरी' या घोडदळासाठी 'सहायक शल्यचिकित्सक' म्हणून नेमणूक झाल्यानं डॉ.गिब्सन ब्रह्मदेशातून मुंबईत माटुंगा इथे आले. इ.स.१८३० मध्ये गुजरात,कोकण आणि दख्खन इथे लसीकरणाच्या कामासाठी त्यांची नियुक्ती झाली. मराठी, हिंदी, गुजरातीत ते बोलू शकत. भिल्ल आणि अन्य आदिवासी समाजाबरोबर मोहाच्या लागवडीसंबंधी डॉ.गिब्सन यांनी उत्तम संवाद साधला.
ईस्ट इंडिया कंपनीला जहाज बांधणीसाठी लागणाऱ्या लाकूड पुरवठ्यात टंचाई निर्माण झाल्यानं इ.स.१८४० मध्ये मुंबई सरकारनं पश्चिम घाटातल्या उत्तर अरण्यांचं सर्वेक्षण करण्याचा आदेश डॉ. गिब्सन यांना दिला. इ.स.१८४० ते १८४४ या काळात घोडेस्वारी करत डॉ.गिब्सन यांनी हे सर्वेक्षण पार पाडले. मलेरिया, विषारी वायू यांचा धोका टाळण्यासाठी गिब्सन पहाटे तीन वाजता उठून आठ मैल अंतर विजेरीच्या प्रकाशात पायी चालत असे. चार मैल घोड्याच्या पाठीवर तर सकाळी आठ वाजेपर्यंत चार मैल अंतर डोलीतून कापत असे. शंभर दिवस ८०० मैलांचा प्रवास करत मुंबई ते दक्षिण कर्नाटक पर्यंतचे दौरे त्यांनी पार पाडले. त्यावेळी मोठ्या प्रमाणातली वृक्षतोड आणि उजाड व नापिक जमीनींचे पट्टे डॉ. गिब्सन यांना आढळून आले. कोळसा, कृषी साधनं, चाकं, नागरी कामं, खांब, दारुगोळा वाहून न्यायच्या गाड्या, बंदुका, इंधन, इ. गोष्टींसाठी विशाल अरण्य नष्ट झाली होती. इ.स. १८४२ मध्ये त्यांनी नोंद करून ठेवली होती की, ' स्थानिक लोक वृक्षतोड करण्याच्या बाबतीत तयार आहेत पण वृक्षारोपणाच्या बाबतीत अजिबात जागरुक नाहीत.' लोकांकडे अरण्याची जबाबदारी सोपवण्याबाबत डॉ. गिब्सन यांनी सरकारला पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आणि अमर्याद वृक्षतोडीवर बंधन येण्याकरीता नियम तयार करण्यावर भर दिला. स्थानिक समाजाचा विश्वास संपादन केला. झाडांच्या अतिरिक्त छाटणीतून लोकांना लाकूड दिलं. लोकसहभाग आणि भागिदारीतून सामाजिक वनीकरणाचा पाया घातला गेला. अरण्यांचं सुयोग्य व्यवस्थापन करण्याची गरज गिब्सनने पहिल्यांदा अधोरेखित केली.
इ.स.१८३६ मध्ये पुण्यातल्या 'दापोडी उद्याना' त अधिक्षकपदी मुंबईचे राज्यपाल सर रॉबर्ट ग्रँट यांनी डॉ. गिब्सन यांची नियुक्ती केली. दापोडी उद्यान पवना नदीकाठी ९० एकरांवर वसलेलं होतं. गिब्सनने तेथे औषधी वनस्पती आणि पिकांच्या गुणवत्तावाढीवर भर दिला.डॉ. गिब्सन यांनी एका अज्ञात पोर्तुगीज चित्रकाराला दर महिना २० रुपये पगारावर २६ महिन्यांसाठी नेमलं. स्वतः गिब्सन यांनी जातीनं लक्ष घालून दापोडी आणि हिवरे उद्यानातल्या १७३ वनस्पतींची चित्रं त्या चित्रकाराकडून काढून घेतली. ही चित्रे 'दापुरी ड्राँईग्ज' म्हणून प्रसिद्ध आहेत. एडिंबरा येथे ही मूळ चित्रं आजही सुरक्षित आहेत. १७७ वर्षांपूर्वी गिब्सन यांनी स्कॉटलंडला जी कृषिसाधनं पाठवली होती त्यात कुदळ,फावडे,बी पेरण्याचं यंत्र, नांगर,टिकाव,थापी यांचा समावेश होता. जुन्नरहून पाठवलेली बैलगाडी ' नँशनल म्युझिअम ऑफ स्कॉटलंड ' मध्ये ठेवण्यात आली आहे.
डॉ. गिब्सन यांनी परंपरागत औषधी वनस्पतींवर ४८ च्या वर संशोधन निबंध लिहिले. 'जर्नल ऑफ दि अग्रीकल्चरलअँड हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया' या संशोधन पत्रिकांमध्ये त्यांचं लिखाण प्रसिद्ध झाले होते. आपल्या लिखाणात ते म्हणतात, ' पहाडी जंगलातलं कुजलेलं लाकूड आणि पाचोळा स्वच्छतेसाठी बाजूला केला नाही तर त्यातून प्रचंड प्रमाणात वनस्पतीजन्य खत तयार होतं. खालच्या भागात सुपिकतेचा मोठा परिणाम साधू शकेल असं हे खत पावसाच्या माध्यमातून वाहून नेलं जातं.' इ.स. १८५२ मधल्या आपल्या फॉरेस्ट रिपोर्ट मध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे की, ' जंगलतोडीमुळे ओढे कोरडे होतात; सर्वसाधारण वार्षिक तापमानवाढ होण्यावर, त्याचप्रमाणे वातावरणातली शुष्कता वाढवण्याच्या रुपानं थेट परिणाम होत असतो.' यातून त्यांची अभ्यासू वृत्ती दिसून येते. स्थानिक तरुणांना शास्रशुद्ध वनस्पतीशास्राच्या अभ्यासासाठी व वनशास्रात रूची निर्माण होण्यासाठी त्यांनी हिवरे येथे एक ग्रंथालय सुरु केले होते. त्याकाळी या ग्रंथालयाचं मूल्य होतं १००० रुपये ! गिब्सन यांनी हर्बेरिअम केलेले जुन्नर परिसरातील जैव विविधतेने नटलेल्या वनस्पतींचे मूळ शास्रीय नमुने आजही वातानुकूलित कक्षात आर.बी.जी क्यू लंडन येथे सुरक्षित ठेवलेले आहेत. 'बॉम्बे फ्लोरा' 'हँडबुक टू दी फारेस्ट ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी' ही महत्वाची दस्तऐवज असलेली पुस्तकंही गिब्सनने लिहिली. इ. स. १८६४ मध्ये गिब्सनने स्कॉटलंडला प्रयाण केले.
माँट्रेज मधल्या श्रद्धांजली सभेत गिब्सनसाठी उच्चारलेले शब्द हेच त्यांच्या कार्याचे फलीत होते.
ते शब्द होते :
'' दिलदार आणि महनीय व्यक्तिमत्वाच्या डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी स्वतःसाठी आरामशीर जीवनशैली कधीच स्वीकारली नाही. परंतु इतरांच्या कल्याणासाठी, सुख सुविधांसाठी प्रयत्न करायला ते नेहमीच तत्पर असत. भारतातील वनसंपत्ती जपण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी आजीवन अथक प्रयत्न केले ! "
- विठ्ठल पांडे.
बांगडगड (आळु)
श्रीमंत उदाबाई होळकर वाघमारे वाडा खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव)
मंचर मधील पिंपळगाव फाट्यावरून जवळच सात कि.मी अंतरावर पिंपळगावला पोहचता येते. येथुन घोड नदी ओलांडली की आपण खडकी गावात येतो. सतराव्या शतकातील पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा असलेले मोठे प्रवेशद्वार आपल्या डाव्या हाताला निदर्शनास पडते. याच वेशीतुन आपण मुख्य गावठाणात आपण प्रवेश करतो. मुळातच खडकी गाव घोड नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेले असल्याने येथील नैसर्गिक सुंदरता पाहण्यायोग्य असुन हा भु -भाग कृषी प्रधान आहे. खडकी गावच्या ऐतिहासिक वास्तूचे कागदोपत्री पुरावे पहावयास मिळाले नाही परंतु दोन ठिकाणी कोरलेले शिलालेख व वाड्याच्या मुख्य प्रवेश व्दारावर कोरलेले दगडी शिल्प खुप काही सांगुन जातात. व हेच खरे येथील ऐतिहासिक वास्तूचे भक्कम पुरावे म्हणता येतील. या वाड्याच्या भिंती व प्रवेशद्वार पहाता हा निश्चितच भुईकोट किल्ला असल्याचा भास होतो. कारण या वाड्याचा विस्तार खुप मोठा असल्याच्या खुणा आपणास जागो जागी निदर्शनास येतात. येथील असलेला वाडा व नदीवर बांधण्यात आलेला जवळपास अर्धा कि.मी लांबीचा घाट आपले विशेष लक्ष वेधून घेतो. येथील इतिहास म्हणजे हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला असे गावक-यांकडून सांगितले जाते.
जुन्नर तालुक्यात आढळला दुसरा ऐतिहासिक दगडी रांजण.
लागाचा घाट
गोळेगाव व बल्लाळवाडी गाव हद्दिवरील दुर्लक्षित खांबटाके.
माणिकडोह धरणात(जुन्नर) दडलेल्या ऐतिहासिक खजान्याचे रहस्य.
श्री.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पारतंत्र्यातुन मुक्तता करण्याचा विडाच उचलेला होता. मनुष्य बळ स्वबळाने निर्माण केल होत.परंतू यासाठी मुबलक प्रमाणात साधनसंपत्तीची गरज होती. या आधी आपल्याच बांधवाकडून शत्रुसैन्याने लुबाडलेली धनदौलत त्यांनी सुरतवर आक्रमण करून ती पुन्हा मिळविण्यासाठी छापे टाकून लुटले होते, परंतु तरीही स्वातंत्र्यासाठी ती धनदौलत पुरेशी नव्हती. पुन्हा एकदा सुरतवर छापा टाकण्यात आला परंतु यावेळी राजांनी पुण्याला राजगडावर पोहचण्याचा मार्ग बदललेला होता. कारण शत्रु सैन्याला याची भनक लागली होती. राजांनी तुरंत निर्णय घेऊन ठाणे, कल्याण,आजचा माळशेजघाट, मढ (पारगाव) निमगीरी मानिकडोह, जुन्नर मार्गाने घोडदौड सुरू केली. शत्रू सैनिकांना याबाबतची भनक पुन्हा लागली व महाराजांचा पाठलाग सुरू झाला. जवळपास असलेले लुटीतील माणिकरत्ने प्रवासाला अडथळा निर्माण करू लागले. राजांना काही पर्यायच सुचत नव्हता. हाती आलेल्या धनावर शत्रू पुन्हा कब्जा करतो की काय असे अनेक विचार त्यांच्या मनामध्ये डोकाऊ लागले. तो पर्यंत ही घोडदौड सह्याद्रीच्या झाकाळलेल्या किर्र जंगल मार्गाने माणिकडोह (जुन्नर) गावापर्यंत पोहचली होती. माणिकडोह गावाला वरदान लाभलेली कुकडी माई नदि या घोडदौड करणार्या व भारतभुमीचे पालनहार करणार्या राजाकडे कुतुहलाने पाहत होती. ती अबोल असल्याने राजाशी वार्तालाप करण्याची इच्छा असुनही काही बोलु शकत नव्हती. तीचे ते वाहत असतानाचे शांत रूप काहीतरी विचार करण्यासारखे राजांना भासले व घोडदळ करणारे सर्व सैन्य येथे थांबले. राजांनी येथे थांबण्याचा घेतलेला निर्णय सर्वांना आश्चर्य कारक वाटत होता. कारण पाठलाग करनारा शत्रू जवळ येऊ लागला होता.
त्यावेळी शिवाजी महाराजांचे सैन्य या कुकडी नदीच्या डोहाजवळ पोहचले. क्षणाचा विलंब न करता लुटून आणले माणिकरत्ने राजांनी त्यात बुडविण्याचा आदेश दिला. ती सर्व माणिकरत्ने तेथे आपणास शत्रुपासून सुरक्षित राहुन पुन्हा उपलब्ध होतीलच ह्या दृढ निश्चयाने महाराजांनी पुण्याच्या दिशेने तेज घोडदौड सुरू केली. आणि ही संपत्ती एक महिन्यानंतर सुखरूप राजगडावर पोहचविण्याची जबाबदारी मोरोपंत पिंगळेवर सोपविण्यात आली होती. मोरोपंतांनी पण हे आव्हान स्वीकारून जबाबदारी पुर्ण केली होती.
एवढा मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या कुकडी माई डोहाला माणिकडोड नाव देण्यात आले. नविन बांधण्यात आलेल्या धरणालाही माणिकडोह धरण म्हणुन संबोधन्यात आले. या धरणाला शहाजी सागर म्हणुन ओळखले जाते.हे धरण बिबटय़ा निवारणकेंद्र माणिकडोह च्या अगदिच लागुन पश्चिमेला आहे. याच धरणातून पुर्वीचा सर्वात मोठा कल्याण , नाणेघाट ते पैठण पुरातन मार्ग होता. त्यामुळे या वाटेत अनेक ऐतिहासिक वास्तू बांधण्यात आल्या होत्या. त्याच पैकी आपणास छायाचित्रात असलेल्या निजामशाहीच्या कालखंडातील दोन मस्जिद दिसत आहे. एक मस्जिद सध्याच्या तेजूर गावच्या उत्तरेस धरणात आहे, तर तीन मस्जिद राजुर नंबर 1 या गावाच्या दक्षिणेस धरणात एकाच ठिकाणी पडझड झालेल्या अवस्थेत आहे.या मस्जिदी निजामकालीन असुन यामध्ये पारशी भाषेतील शिलालेख कोरलेले आहेत.गेली चाळीस वर्षे या मस्जिदींना व माणकेश्वर पडझड झालेल्या हेमाडपंती मंदिराला जलमय समाधी मिळाली होती. परंतु या वर्षी पावसाचे घटते प्रमाण असल्याने व पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्याने धरणाची पाणी पातळीने निचांक गाठल्याने गावकर्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत असून पर्यटक या वास्तू पाहण्यासाठी आकर्षित होत आहेत. चाळीस वर्षापुरर्वी याच मस्जिदीच्या पाठीमागे लागुनच तेजूर आणि राजुर ही दोन गावे होती. धरण बांधण्यात आल्याने ही दोन गावे एक धरणाच्या उत्तरेला तर दक्षिणेला डिव्हाईड झाली व राजुर गावचे दोन भाग झाले. आज त्यांना ग्रामपंचायत जरी एक असली तरी तेजूर नं – 1, तेजूर नं – 2 अशी एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
आपणास या वास्तु पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच या स्थळाला भेट द्यायला विसरू नका. कारण आज आपण पाहीले व नंतर कालावधीत सतत चांगला पाऊस झाला तर पुन्हा कधी या वास्तूंचे दर्शन घडेल हे सांगणे कठीणच आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याची दुर्लक्षित Prehistoric art
जुन्नर परिसरातील बारवा :-
मांजरवाडी गावची ऐतिहासिक बारव.
अप्रतिम पुष्करणी व ऐतिहासिक बेल्हे.
श्रीमंत सरकार मीर कासीम यांनी बांधलेल्या गढीच्या दक्षिण- पूर्व दिशेला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली व मध्ययुगात निजामशाहीकडे जाण्यासाठी अतिशय जवळची समजली जाणारी वेस डौलदारपणे उभी असल्याचे दिसत असले तरी वापराविना ती भग्नावस्थेत झाल्याचे दिसते.या वेसेची उभारणी महसुली कारभाराचे अधिकार क्षेत्र असलेल्या श्रीमंत सरकार नबाब मीर कासीम यांनी निजामशाहीशी जवळीक साधण्यासाठी केली होती. त्याच पद्धतीची एक वेस पश्चिम दिशेला आहे. पश्चिमेच्या वेसेतुन प्रवेश करून याच निजामशाहीकडील वेशीतून छत्रपती संभाजी राजे गढीवर स्वारी करून बाहेर पडले होते, असा उल्लेख जयपूर येथून प्रसिद्ध होणार्या औरंगजेबाच्या द-दरबार-इ-मुअल्ला (जयपूर) या वर्तमानपत्रात 29 डिसेंबर 1684 रोजीच्या अंकात होता. लेखिका कमल गोखले यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या पुस्तकात मराठा-मुघल संघर्षात याबद्दलचा उल्लेख आढळून येतो.
पुढे याच बेल्हे गावच्या गढीची जहागीरदारी जुन्नरच्या नवाब मिर कासिम यास मिळाली होती. पुढे या नवाबास एक कन्यारत्न झाले व तो पुत्र प्राप्ती पासुन वंचितच राहीला. त्याने आपल्या लाडक्या कन्येचा विवाह गुजरातमधील सुरत गावच्या नवाब आलम खानशी लावून दिला. बेल्हे गावचा नवाब पुढे कालवश झाला व या गढीची जहागिरी सुरतच्या नवाबाकडे गेली.
पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर बेल्हे गाव वसलेले आहे. साधारण पणे १९३० च्या दशकात बेल्हे ग्रामपंचायत व बाजाराची सुरुवात झाली. सुरुवातीला बाजार हा जुन्या आळकुटी रस्त्यावरील टका वस्ती या भागात भरत होता. त्या वेळेचे त्याचे स्वरूप म्हणजे भाजी पाला किराणा सामान, कडधान्य, बाजरी, ज्वारी, गहू, असा सर्व गावरान सकस व रासायनिक खतापासून मुक्त अशा प्रकारची धान्ये मुबलक प्रमाणात मिळत असत. त्या वेळी बाजारात खरेदी विक्री करत असताना वस्तू विनिमय जास्त चालत असे. त्या वेळचे चलन म्हणजे भोकपड्या पैसा, घोडा छाप पैसा तांब्याचे चलन, कथलाचे दोन पैसे, एक आणा, पितळी दोन आणे, चांदीचे चार आणे, आठ आणे, राणी किंवा राजा छाप चांदीचा रुपया अशा प्रकारचे चलन वापरात असे. त्या वेळी बाजारात येणाऱ्या व्यापारी व ग्राहकांची संख्या हि शंभर ते दीडशे च्या घरात असायची. सोळा आण्याच्या रुपया मानला जात असे त्या सोळा आण्याला मणभर म्हणजे चाळीस किलो धान्य मिळत असे. सोळा आण्याला चाळीस अंडी व दीड ते दोन रुपयाला गावरान कोंबडी मिळायची. दोन पैश्यांची केळी संपूर्ण घराला पुरत असत.बाजारात होणारी ये-जा हि पायीच असे. माल वाहतुकीसाठी बैलगाडी व घोडागाडी वापरली जात असे. बाजारात येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणकोळी समाजाकडून पखाली मार्फत केली जायची. त्या नंतर बाजारातील वर्दळ वाढू लागल्याने व टका येथील जागा कमी पडू लागल्याने १९४० नंतर बाजार हा बेल्हे गावात त्या वेळेचे नबाब ह्यांच्या गढी जवळ व मारुती मंदिराच्या आसपास भरू लागला. परंतु येथेही जागा कमी पडू लागल्याने १९४५ नंतर बेल्हे बाजारचे स्थलांतर आजच्या ठिकाणी म्हणजे गावातून जाणाऱ्या कल्याण – अहमदनगर महामार्गावर लागत असणाऱ्या मोकळ्या ६-७ एकर क्षेत्रावर भरपूर झाडे असणऱ्या ठिकाणी झाले. त्या वेळी बाजारावर ग्रामपंचायत नियंत्रण असायचे. त्या मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून गावात विकास कामांना चालना मिळायची. त्यावेळेपासून सर्व शेतकरी व व्यापारी यांची जागा ठरलेली असायची. त्यात कापड दुकानदार, जुन्या कपड्याचा बाजार, अंडी व कोंबडी बाजार,सुकी मासळी बाजार, मसाले, किराणा समान, धान्याचा भुसार बाजार, चप्पलांचा व चामड्यांचा वस्तू ह्या एका बाजूला असायच्या व भाजीपाला आणि फळ फळावळ इतर गरजेच्या वस्तू ह्या एका बाजूला असायच्या आजही परंपरे नुसार तसेच दृश्य दिसते.
ह्या बाजाराचे वैशिष्ठ्य म्हणजे बैल बाजार हा बाजार एका बाजूला ४-५ एकरात भरत असयचा. ह्या बाजारात जवळपासच्या गावातील बैल व इतर जनावरे विक्री साठी यायची. तसेच प्रामुख्याने पंढरपुरी (खिलारी), गावठी, भडोशी या जातीचे बैल पंढरपूर, सातारा सांगली, इस्लामपूर, मंगळवेढे, कर्नाटकातील बेळगाव व ईंडी या ठिकाणाहून जातिवंत बैल विक्रीसाठी येत असत. या बैलांसाठीचे खरेदीदार हे परजिल्ह्यातून म्हणजे लासलगाव नाशिक, लोणी प्रवरा, जामखेड, टोकावडे, म्हसे, मुरबाड, सरळगाव, यासह इतरही ठिकाणाहून येत असत. पूर्वी आजच्या सारखी वाहतुकीची सोय नसल्याकारणाने जनावरांची वाहतूक हि पायीच केली जायची. १९४० च्या दरम्यान हा बाजार शनिवार पासूनच सुरु होऊन तो मंगळवार दुपारपर्यंत चालू असायचा. येणाऱ्या व्यापाऱ्यांची व शेतकऱ्यांची जेवनाची व्यवस्था अतिशय अल्पदरात सोनाबाई शिंदे, सावित्राबाई बनकर, महादू संभेराव, बबनराव जगताप, रंगनाथ पोपळघट, कासाबाई बांगर यांच्या जेवणाच्या खानावळी होत्या. त्यात प्रामुख्याने मटकी उसळ,
पुरी, असा जेवणाचा बेत असायचा. हे जेवण फक्त काही आण्यात, व चहा दोन पैश्यात मिळत असे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भोवतालच्या तीन विहिरीमधून करण्यात यायची. विहिरीतून पाणी बदलीने ओढून व हंड्याने डोक्यावर घेऊन एक पैशाला तांब्या व एक आण्याला एक हंडा विक्री होत असे. तसेच जनावरांच्या पिण्यासाठी व्यापाऱ्यांना दोन पैशांना हंडा या प्रमाणे विक्री होत असे. तरी देखील एक महिला दिवसभरात साधारणपणे दहा ते बारा रुपयांची कमाई पाणी विक्री करून करत असे.
प्रामुख्याने येथील असलेल्या पुरातन पुष्करणीचा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असे. आजही ही पुष्करणी अंतिम घटका जरी मोजत असली तरी तीची सुंदरता कायम आहे. जुन्नर तालुक्यातील सर्वात सुंदर पुष्करणी म्हणुन मी तर या ऐतिहासिक वास्तूचा निश्चितच उल्लेख करेल. जवळपास 50×40 फुट लांब रूंदी असलेली ही पुष्करणी पहाताच क्षणी लक्ष वेधून घेते. पुर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूला मध्यभागी पुष्करणीत उतरण्याचे मार्ग असून या पुष्करणीच्या दक्षिण आणि उत्तरेस 3×2 उंची व रूंदिचे 5 -5 मोठे दगडी शिल्पमुर्ती ठेवण्यासाठी कोनाडे आहे तर पुर्व व पश्चिमेस 2 – 2 कोनाडे आहेत. पुष्करणीच्या एकही कोणाड्यात कोणत्याही प्रकारची मुर्ती दिसून येत नाही. त्या मुर्ती त्यानंतरच्या कालखंडात जाणिवपुर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला असावा? असे वाटते. सुंदर अशा मोठ मोठ्या तोडीत पुष्करणीचे सुंदर असे बांधकाम करण्यात आले आहे.
सध्या पुष्करणीचा वापर स्थानिक ग्रामस्थ पोहण्यासाठी करत आहे. ही पुष्करणीचे बांधकाम वेगळ्याच शैलीत असल्याचे दिसून येत असल्याने तीचे संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. आजपर्यंत मी ज्या पुष्करणी पाहील्या त्यापैकी सर्वात मोठी व सुंदर असलेली ही पुष्करणी होय. बाँम्बे गॅझिटियर मध्ये ज्या बेल्हे गावातील पुष्करणीचा उल्लेख आढळतो ती हीच पुष्करणी होय. सध्या स्थानिक या पुष्करणीला टक्याची बारव म्हणुन संबोधतात.
इतिहास_ओतूर_गावचा
इ.स १३४७ मध्ये महाराष्ट्रात बहमनी राज्याची स्थापना झाली.त्यावेळी ओतूर गावाचा व जुन्नर परिसराचा समावेश बहमनी राज्यात होता.बहमनी राज्याच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या पाच सत्तां पैकी ओतूर परिसरावर निजामशाहीची सत्ता होती. १० नोव्हेम्बर १५६६ रोजीच्या एका फार्सी पत्रामध्ये ओतूर गावचा उल्लेख वोतूर असा आढळतो.
अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाच्या उत्तरेस एक कि.मी. अंतरावर झाडाझुडपातून ,डोंगरदऱ्यातून खळाळत येणाऱ्या दाक्षिण वाहिनी चंद्रकोर ष पवित्र मांडवी नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात श्री क्षेत्र कपर्दीकेश्वराचे मनमोहक व भव्य मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे देखणे रूप पाहताक्षणीच. भक्तांचा थकवा दूर होतो. बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज संजीवनी समाधी मंदिर व संत तुकाराम महाराज मंदिर या त्रिस्थळी पवित्र स्थानामुळे पावन झालेले हे ठिकाण हवेहवेसे वाटनारे आहे. वारकरी सांप्रदायाचा “रामकृष्णहरि” हा मंत्रघोष याच ठिकाणी प्रथम दिला गेला, म्हणून या स्थानाला धर्मिकदृष्टया अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
उत्तमापूर हे गावचे प्राचीन नाव. या नावातच ओतूर गावाची प्राचीनता लक्षात येते.उत्तमापूर चा अपभ्रंश होत ओतूर हे नाव पुढे पुढे रूढ़ झाले. फार पूर्वीपासून मांडवी नदी किनारी वसलेले समृद्ध प्राचीन नगर आणि “स्वयंभू शिवलिंगाच्या” कपर्दीकेश्वर मंदिराच्या जागृत अशा ठिकाणाचा उल्लेख पुराणकालापासून होत आलेला आहे; परंतु हे स्थान खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते शिवलिंगावरील “कलात्मक” कोरड्या तांडळाच्या पिंडीमुळे आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना त्यांचे गुरु बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज यानी स्वप्नात येऊन अनुग्रह देऊन उपदेश केल्यामुळे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तपश्चर्येसाठी उत्तम असे ठिकाण म्हणून उल्लेख केलेला आहे. संतांची तपोभूमी म्हणून या ठिकाणाला खूप महत्व असूनही पंढरपूर ,आळंदी ,देहू यांच्या तुलनेत ओतूर हे तीर्थक्षेत्राचे स्थान मात्र महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिलेले आहे.
कपर्दीकेश्वर या नावाविषयी एक अख्यायिका आहे. राघव चैतन्य स्वामींचा कार्यकाल १५ व्या शतकातील आहे. त्यांनी मांडवी नदीकिनारी घनदाट अरण्यात महर्षी व्यासांचे दर्शन व्हावे म्हणून कठोर साधनेद्वारे बारा वर्षे अनुष्ठान केले. येथील मांडवी नदीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करीत असताना त्यांना एक कवडी मिळाली. (संस्कृतमध्ये कवडीला कप्रदिक असे म्हणतात). आपल्या तपश्चर्यचे फळ म्हणजे कवडी मिळाल्यामुळे महाराज अतिशय दुःखी झाले. त्यांनी ती कवडी फोडली. त्यात एक अतिशय "तेजस्वी", "सुंदर" "स्वयंभु शिवलिंग" मिळाले. महाराजांच्या प्रेरणेने या लिंगाचे कपर्दीकेश्वर हे नामकरण करुन या ठिकाणी लोकांनी मंदिर बांधले. तसेच नवव्या शतकातील शिलाघर राजवंशातील नववा झंझ या राजाने प्राचीन शिवलिंगावर सुंदर मंदिर उभारले होते. १२व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुध्दा या तपोभूमीचा उल्लेख केला आहे. यादव राजवटीच्या अस्तानंतर अनेक लहानमोठ्या टोळ्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. यात इराणच्या मुस्लीम टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घालून खुप संपत्ती लुटण्याबरोबर या ठिकाणची मंदिरे देखील जमीनदोस्त केली. त्या काळात याच मांडवी तीरावर घनदाट जंगलात या प्राचीन व जागृत शिवलिंगाची स्थापना महर्षी व्यासांनी राघव चैतन्य महाराजांच्या हस्ते करून मंदिर उभारणी केली.
मांडवी नदी ऋषिवर्य मांडव्य ॠषींच्या आश्रमापासून उगम पावून आपल्या दोन्ही किनाऱ्यांच्या पारिसरला विलोभनीयरीत्या सुशोभीत करीन या तीर्थक्षेत्राजवळ येऊन दाक्षिणवाहिनी चंद्राकार घेऊन संथपणे आजही वाहत आहे. याच पवित्र ठिकाणी बाबाजी ऊर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शु. द्वादशी इ.स.१५७१ रोजी वयाच्या ४७व्या वर्षी ओतुर येथे संजीवन समाधी घेतली. ठिकाणी संत चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश करून अनुग्रह देत ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला. या मंत्राचा जप आज जगभर होताना आढळतो. चैतन्यांच्या संजीवन समाधीवर वाढलेले वारुळ हे नैसर्गिक असून, दगड किंवा विटांचा यात समावेश नसूनसुद्धा शेकडो वर्षे होऊनही या समाधीची एक कण माती सुद्धा वेगळी झाली नाही.श्रावण महिन्यात चारही सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरते. १९५३ साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपर्दीकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि १९५८ साली मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. तसेच चैतन्यस्वामी समाधी स्थानावर मंदिर बंधण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचे भव्य असे मंदिर देहु व ओतुर या दोनच ठिकाणी आहेत. नगर - कल्याण रस्त्यावरून गावात प्रवेश करताना "श्री कपर्दीकेश्वर देवस्थान श्री क्षेत्र ओतूर" अशी भव्य प्रवेशद्वार उभारावयाचे आहे यासंबंधी ज्यांना भगवंताची सेवा करायची आहे अथवा आपल्या प्रियजनांच्या स्मरणार्थ योगदान द्यावे.
भिमाशंकर गट बौद्ध लेणी समूह (खानापूर, जुन्नर)
भीमाशंकर लेणी-समूह : या समूहात महत्त्वाच्या १७ लेणी असून इतर आठ अपूर्ण लेणी आहेत. त्यातील लेणे क्र. २ हे चैत्यगृह असून बाकी सामान्य खोल्या आहेत. या समूहात १३ पोढीही आहेत. लेणे क्र. १ च्या दर्शनी भागात, मध्यभागी दोन स्तंभ व बाजूंस अर्धस्तंभ आहेत. याच्या मागे ओसरी असून मागील भिंतीत तीन खोल्या आहेत.
लेणे क्र. २. या चैत्यगृहाच्या दर्शनी भागाची उंची १२.२० मी., रुंदी ६.१० मी. असून, हे दोन भागांत विभागले आहे. लेण्याच्या ओसरीत पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूंस दोन स्तंभ व अर्धस्तंभ आहेत. स्तंभांस खाली कलश नसून ते दगडी बाकावर आधारित आहेत. बाकांस आतील बाजूने पाठ टेकण्यास कक्षासने व बाहेरील बाजूस वेदिकापट्टी कोरल्या आहेत.
चैत्याच्या वरील भागात अर्धगोलाकार असलेला अपूर्ण चैत्यगवाक्ष असून त्यास बाहेरील बाजूने पिंपळाच्या पानासारखा आकार दिलेला नाही. तसेच हा भाग नेहमीप्रमाणे आरपारही खोदला गेला नाही, त्यामुळे या संपूर्ण भागास ‘आभासी चैत्यगवाक्ष’ संबोधले जाते. याच्यापुढे लहानसा सज्जा आहे.
चैत्यगृहाच्या आतील मंडप काटकोनात असून त्यास सपाट छत आहे. या छतावर व ओसरीतील छतावर मातीच्या गिलाव्यांचे अवशेष दिसतात. मागील भिंतीत उभ्या काटकोनात मागील भिंतीपासून वेगळा असलेला दगड आहे. त्यात स्तूप कोरावयाचा असावा; परंतु यावर कालांतराने एक बसलेली ओबडधोबड स्त्री-मूर्ती कोरली गेली. या स्तूपाच्या बाजूस दोन लहान टाकी दिसतात. त्यांच्या मागील भिंतीत असलेल्या भेगांतून पाणी झिरपते व या टाक्यांत साठले जाते. बहुधा पाणी झिरपत असल्याने हे चैत्यगृह अपूर्ण राहिले असावे.
चैत्याच्या प्रांगणात उजव्या भिंतीवर व लेणे क्र. ३ च्या दरवाजावर एक शिलालेख असून त्यात लेण्यासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. वरील चैत्यानंतरची बरीच लेणी साधी असून ती डोंगराच्या चढ-उतारावर जिथे जागा सोयीची वाटली अशा ठिकाणी खोदली आहेत. यांतील एका पोढीस लेणे क्र. ५ दिला असून त्यावर पोढी दान दिल्याचा उल्लेख असणारा लेख आहे. पोढीपासून थोड्या अंतरावरील लेणे क्र. ७ हे अत्यंत सामान्य असले तरी त्याच्या डाव्या भिंतीवर कोरलेला लेख ऐतिहासिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. त्यात महाक्षत्रप ‘नहपान’ याचा मंत्री ‘अयम’, जो वत्स गोत्रातील होता, त्याने या मंडप (मटप) व पोढीस, वर्ष ४६ (इ. स. ७८) मध्ये पुण्यकर्मार्थ दान दिल्याचा उल्लेख आहे. संपूर्ण जुन्नरच्या लेण्यांत तत्कालीन राजवंशाचे नाव दर्शविणारा हा एकमेव शिलालेख आहे. क्र. ८ पासून १७ पर्यंतची लेणी ही सामान्य खोल्या आहेत. त्यांत कलाकुसरींचा अभाव आहे.
जुन्नर तालुक्यातील गाडलेल्या ४ लेणी समुहांचा शोध :-
जुन्नर तालुक्यातील पाडळी येथील डोंगररांगांत नवीन ४ लेणी समुहांचा शोध लागल्याची माहिती माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे यांनी दिली.असून हे चारही लेणी समूह संपुर्ण मातीत गाडलेले असल्यामुळे त्या गाडलेल्या ढिगा-यांखाली किती लेणी असतील याचा अंदाज बांधता येणे मात्र अवघडच आहे. तसा फक्त अनुमान जर लावलाच तर कमीत कमीत १० ते १५ लेणी तरी उत्खननानंतर जगासमोर येतील असा अंदाज येतो. काही ठिकाणी दोन, काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी अगदी पाचच्या आसपास लेणी समुहांचा तेथील कातळकोरीव कडे पाहून अंदाज येतो. पैकी एक लेणी समुहात शिवलिंग कोरलेले असून ते केंव्हापासून असावे याचा अंदाज बांधता येत नाही. कातळ कोरीव कलेतून हा संपूर्ण बौध्दकालिन वारसा असावा असे वाटते. २०१५ साली या शिवलिंग असलेल्या लेणीस खरमाळे यांनी प्रथमभेट दिली होती. यानंतर याच डोंगर रांगेवर जसजसा वेळ मिळत गेला तसं तसा तेथील शोध घेत गेले. आजुन पण खूप काही येथे दडलेले उजेडात येऊ शकते व जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक वारसेत व जागतीक लेणी समुहांच्या संख्येत भर पडू शकते असे ही त्यांनी सांगितलेअपरिचीत भागडेश्वर लेणी :-
(वळती ता. आंबेगाव जि. पुणे)खोडद जवळ भागड्या डोंगर रांग आहे. ही डोंगररांग म्हणजे आंबेगाव तालुक्यातील पुर्वेकडील रांग होय. उत्तरेकडून औरंगपूर, भागडी, आणि वळती अशी दक्षिणेकडे जवळपास तीन ते चार कि.मी पर्यंत पसरलेली रांग आहे. जंगलव्याप्त सपाट भुभागामध्ये येथील वनराई असल्याने, अनेक विविध पक्षी, प्राणी व वनस्पतींचा वारसा या परिसरास लाभलेला आहे. पुर्व पट्यातील एकमेव भटक्या पर्यटकांची जणू ही पंढरीच. येथे फिरताना मोकळा श्वास घेता येतो. ट्रेकसाठी तर सर्वोत्तम पुर्व मार्ग म्हणता येईल. आणि तो पण डोंगराच्या क्षितीजावरून. दोन्ही बाजूचे नयनदृष्य एकाच वेळी सहज टिपता येते एवढे निकट असलेला हा पायवाट मार्ग आहे. दुरवरून कानी येणाऱ्या विविध पक्षी व प्राण्याचे आवाज मनमोहीत करतात.
आतील एक शिल्प खरे तर अवलोकितेश्वर आहे सोबत तारा व भृकुटी आहे …पण ह्याना आज आपण भगवान विष्णू म्हणतो … तर दुसरे शिल्प धनुष्यबाण धारकाचे आहे व ही दोन्ही शिल्पे 12 व 13 व्या शतकातील असल्याचे श्री. महेंद्र शेगावकर सांगतात.
येथील इतिहास भार्गवराम व त्यांच्या सहाव्या अवतारा बाबत लिहिला गेला आहे व त्यामुळे येथील डोंगराला भागड्या डोंगर म्हणुन संबोधतात. कदाचित भार्गव शब्दाला इंग्लिश मध्ये लिहीताना र च्या ठिकाणी ड चा उच्चार होत असल्याने भागड्या म्हणुन संबोधले गेले असावे किंवा शब्द उच्चारताना येथील त्यावेळच्या अशिक्षित ग्रामस्थांनी असा उल्लेख केला असावा असे मला वाटते.
माणिकडोह (जुन्नर) येथील शोध नव्या बौद्धकालीन लेण्यांचा.
जुन्नर शहराच्या पश्चिमेला सात कि.मी अंतरावर डोंगराळ भागात वसलेले छोटेसे गाव म्हणजे माणिकडोह होय. येथे जाण्यासाठी वापरात येत असे ती पुरातन व्यापाराची व नाणेघाटला जाणारी वाट. परंतु काळ बदलत गेला व या पाऊल खुणा व या वाटेचा इतिहास बुडला गेला तो माणिकडोह धरणाखाली. श्री. शिवछत्रपतींच्या दुसर्या सुरतेच्या लुटीतील लुटलेले मानिकरत्न ज्या डोहात बुडावले गेले ते येथील कुकडी नदीच्या डोहात. कुकडी माईच्या पात्रखडकात पाण्याने जवळपास सांदन व्हॅली सारखी ५०० मीटर लांब घळ नैसर्गिक रित्या तयार झालेली असून जवळपास ती ४० ते ५० फुट खोल असून तिच्या तोंडावर बांधलेला यशवंत घाट व गावातील विविध दगडी शिल्प आपणास पुरातन इतिहासात डोकावण्यास भाग पाडतात.
गावाच्या दक्षिणेस जवळच अर्ध्या कि.मी अंतरावर पुर्व, पश्चिम डोंगररांग पसरलेली असून ही रांग पुर्वेकडे तुळजाभवानी लेणी समुहापाशी संपते. परंतु पश्चिमेस गेलेल्या रांगेतील लेणींचादरा म्हणुन नाव असलेल्या ठिकाणी ही लेणी पहावयास मिळते. ज्या ठिकाणी सध्या खडी क्रेशर जे माणिकडोह धरणाच्या भिंतीच्या रेषेत दक्षिणेस दिसून येते त्याच ठिकाणी डोंगराच्या मधभागी वाटीच्या आकारातील कातळात या लेणी कोरलेली दिसून येतात. ही लेणी कोरण्या आधी येथे प्रथमतः पाण्याची दोन टाकी खोदण्यात आल्याचे लक्षात येते. येथील डोंगररांगावर त्याकाळी येथे सहज कंदमुळे उपलब्ध होत असे परंतु पाण्यासाठी मात्र माणिकडोह गावाकडे धाव घ्यावी लागत असेल कारण मानवाच्या दोन मुख्य गरजा म्हणजे अन्न आणि पाणी होय. त्यामुळेच प्रथम येथे टाकी कोरली गेली असावित.येथील कातळाचा अभ्यास करता या लेणी कोरताना कच्च्या स्वरूपात आढळुन आला व त्या त्या ठिकाणी काम अर्धवट सोडलेल्या खुणा आढळतात.
या लेणीमधून समोरील दृश्य मनाला भुरळ घालणारे असून, माणिकडोह धरण, किल्ले हडसर, हटकेश्वर डोंगररांग व यामधील येणारा सपाट भुभाग न्याहाळता येतो. त्यामुळे येथे लेणी कोरण्या पाठीमागचा उद्देश देखरेख संरक्षण म्हणून असावा असे वाटते.
येथील सुंदरतेला चार चांद पावसाळ्यात लागलेले दिसतात. दोन्ही बाजूने कड्यावरून घरंगळत येणारे दोन धबधबे लेणी संपताच एकमेकांना अलिंगण देऊन या लेणी समूहाला आपल्या मिठित घेतल्याचे सुंदर दृष्य पाहून मन भारावून जाते.कधी माणिकडोह धरण दर्शन तेजूर गावाकडून घेण्याची इच्छा झालीच तर या लेण्यांना पाहून नेत्रसुख नक्कीच घ्या.
या अपरिचित लेण्या.श्री. विनायक खोत सर, शिवाजी ट्रेल व हिस्ट्री क्लबने जगासमोर आणण्याचा छोटा प्रयत्न केला असून या माणिकडोहच्या बौद्धकालीन लेणी दुर्गप्रेमींसाठी अभ्यासपर्वणी ठरणार आहेत.
लेखक /छायाचित्र श्री. खरमाळे रमेश
यानंतर आपण माहिती घेउया जुन्नर परिसरातील धार्मिक स्थानांची अर्थातच मंदिरांची.
पुरचे कुकडेश्वर मंदीर :-
शिलाहार वंशातील/ घराण्यातील असंख्य राजे जुन्नर प्रदेशात राज्य करून गेले. त्यापैकी कपर्दिन, पुलशक्ती, झंझ, वज्जड, चित्तराजा, मुन्मुणी, अनंतदेव , अपरादित्य, केशीदेव व शेवटचा सोमेश्वर हे राजे प्रमुख होते.ह्या शिलाहारांनी असंख्य मंदिरे बांधली. अंबरनाथचे कोरीव शिवमंदिर, ठाण्याचे कौपिनेश्वर मुन्मुणी राजाच्या कारकीर्दीत बांधले गेले, तर झंझ राजाने पूरचे कुकडेश्वर, हरिश्चंद्रगडावरचे हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वरचे नागेश्वर, रतनवाडीचे अमृतेश्वर अशी शिवालये बांधली.
साधारण इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो मग स्थानिक लोक यास पांडवकालीन म्हणतात.अर्थातच त्यात काही तथ्य नाही.
सह्याद्रीत भटकंती करताना नाशिक ते जुन्नर या भागात उगम पावणाऱ्या नद्यांच्या उगमस्थानाजवळ शिवभक्त शिलाहार राजा झंज याने बारा शंकराची मंदिरे बांधली ही आख्यायिका ऐकायला मिळते. पण खरोखर ही मंदिरे झंज राजाने बांधली आहेत का? झंज राजाचा राज्यकाल किती होता सांगणारा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे. आजपर्यंत झंज राजाचा कोणताही शिलालेख किंवा ताम्रपट अभ्यासासाठी उपलब्ध झालेला नाही आहे. झंज राजाचा कोणताही पुराभिलेखीय पुरावा (शिलालेख/ताम्रपट) नसल्यामुळे त्याच्या काळातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी किंवा त्याच्या राज्यकाळात त्याने बांधलेल्या मंदिरांची माहिती मिळू शकत नाही.अरब इतिहासकार आणि भूगोलतज्ञ अल मसुदी याने आपल्या प्रवासवर्णनात सन ९१६ मध्ये शिलाहारांसंदर्भात पुढीलप्रमाणे नोंद करून ठेवली आहे. “सामूर (चौल) येथे राज्य करणाऱ्या राजाचे नाव झंज (Djandja) असे आहे.”
झंज राजाने बांधली म्हणून ज्या मंदिरांचा उल्लेख केला जातो, ती मंदिरे पुढीलप्रमाणे.
जर झंज राजाच्या काळात ह्या मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असे मानले आणि ही मंदिरे त्याच्या कार्यकालात पूर्ण न होता नंतरच्या राजांच्या कार्यकालात पूर्ण झाली असे मानले, तर त्या राजांनी शिलालेख नोंदून ठेवले असते. उदा. अंबरनाथ शिवमंदिरातील राजा मम्मुनी याचा शिलालेख. छित्तराजा हा पण मोठा शिवभक्त होता. त्याने अंबरनाथ येथील प्रसिध्द भूमिज शैलीतील शिवमंदिर बांधायला सुरुवात केली. पण ते मंदिर छित्तराजाच्या कारकिर्दीत पूर्ण न होता मम्मुनी राजाच्या कार्यकालात पूर्ण झाले. तर अंबरनाथ मंदिरात तश्या अर्थाचा शिलालेख कोरून ठेवला आहे.
झंज राजाने बांधली म्हणून जी बारा मंदिरे सांगितली जातात, त्यापैकी फक्त हरिश्चंद्रेश्वर, अमृतेश्वर आणि नागेश्वर हीच तीन मंदिरे मूळ रुपात आहेत. बाकीची मंदिरे धरणाच्या पाण्यात गेलेली आहेत किंवा त्यांचे आधुनिकीकरण झालेले आहे.मंदिराची शैली ओळखण्यासाठी मंदिराचे शिखर महत्त्वपूर्ण ठरते. हरिश्चंद्रेश्वर मंदिर नागर शैलीत, अमृतेश्वर मंदिर भूमिज शैलीत आणि नागेश्वर मंदिर फांसणा शैलीत आहेत. कुकडेश्वर मंदिराचा शिखर नष्ट झालेले असल्यामुळे त्याची निश्चित शैली सांगता येणार नाही. जर झंज राजाने ही मंदिरे बांधली आहेत, तर त्यांची शैली वेगवेगळी का?तसेच झंज राजा मंदिरे बांधतो ती पण त्याच्या राजधानीपासून भरपूर लांब ठिकाणी. असे का? त्याला मंदिरे बांधायचीच असती तर ती त्याने राजधानीच्या आसपास बांधली असती. ज्या प्रदेशात ही सगळी मंदिरे आहेत तो प्रदेश झंज राजाच्या ताब्यात होता का हे पण आपल्याला माहिती नाही. त्यामुळे सद्यस्थितीत नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील नद्यांच्या उगमावर असलेली बारा मंदिरे झंज राजानेच बांधलेली आहेत ह्या दाव्याला आपल्याकडे कोणताही ठोस पुरावा नाही आहे.

जायचे कसे :
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंड वरून घाटघरला जाणाऱ्या मार्गातून चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किमी एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किमी वर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. पण ते २ तास चालणेही हे मंदीर पाहिले कि सार्थकी लागतात. गावाचे नाव 'पुर ' असून कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे. जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे.
बसच्या वेळा : जुन्नर ते कुकडेश्वर
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर (कुकडेश्वर वरून) : सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०
सद्यस्थिती :



प्रवेशद्वारावरील शिल्पे




मंदिराच्या आतील भागातही खूपच सुंदर नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.


हे शिव मंदिर फार पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. काही वर्षांपूर्वी या मंदिराचे शिखर ढासळले त्यामुळे पुरातत्व खात्याने मंदिराच्या उरलेल्या भागाची पुनर्बांधणी केली.मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे.




राहायची व्यवस्था :
गावात कोणाकडे तरी जेवणाची व्यवस्था होऊ शकते. राहायचे असेल तर मंदिरासमोर पुजारी काकांचे घर आहे त्याच्या समोर मोठी ओसरी आहे. १५-२० लोक तेथे झोपू शकतात.
अजून काही :
१. महाराष्ट्र सरकारने हे शिवालय तीर्थक्षेत्रे बनवून त्याचा विकासकाम (?) हाती घेतले आहे.
२. कुकडेश्वर मंदिर हे 'क- वर्गीय' मंदिर असून त्या मंदिरामागील डोंगरामधून कुकडी नदीचा उगम आहे. गावातील काही लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'पूर' गावातील डोंगर व दाऱ्या घाटातील डोंगरामध्ये शिखरावर कुकडी नदीचा उगम असून त्यानंतर तेथून नदीचा प्रवाह लुप्त झालेला आहे. तो लुप्त झालेला प्रवाह कुकडेश्वर मंदिरापासून चालू होतो. जेथे प्रवाह चालू होतो (नदीचा उगम होतो) तेथे छोटेसे मंदिर बांधले आहे. कितीही पाणी टंचाई आली तरी येथे बारमाही पाणी असते.
३. पुढे कुकडी नदीवरच माणिकडोह धरण बांधलेले आहे.
४. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबाला हि जाऊ शकतो.
ठाकुर द्वार मधुसुदन मंदिर जुन्नर एक आगळी वेगळी कथा.
जुन्नर शहर एका भातखळ्या तलावाच्या किनारी व किल्ले शिवनेरीच्या दक्षिण पायथ्यालगत वसले होते. आजही त्याचे भक्कम पुरावे आपणास तेथे पहावयास मिळतात. मग प्रश्न असा पडतो की सर्वच गाव तेथून दुसरीकडे का गेले असावे? तीच कथा पुढे ऐकावयास मिळाली.
रोगराई व आकस्मिक मृत्यूचे तांडव या भातखळ्या ठिकाणी चालू झाले होते. संपूर्ण परिसर झाडाझुपांनी वेढलेला होता. जागेचा दोष म्हणून काही कुटूंबांनी येथून निघता पाय घेतला होता. जो तेथे राहील तो संकटाच्या भोव-यातच फिरत राहत असे. कुकडी माईचे पाणी येथे उपजिवीकेसाठी जवळ आहे म्हणून लोक (नविन सध्याचे जुन्नर) आहे येथेच झोपडय़ा करू लागले. एक एक करून सर्वजण तेथून नवीन जागी सध्याचे जुन्नर या ठिकाणी स्थलांतरित झाले. मग गावचा देव तेथे कसा राहणार म्हणून गावक-यांनी तो उचलून आणण्याचा प्रयत्न केला. म्हणे ती शिळा उचललीच नाही. अथक प्रयत्न केले सर्व व्यर्थ गेले. एकदिवस एका ठाकराच्या स्वप्नात “हा बालाजी” देव गेला व त्यास दृष्टांत दिला, की मला घेऊन जायचे असेल तर नंदी असलेल्या बैलगाडीत घेऊन जा. त्यावेळी फक्त दोनच व्यक्ती मला उचलतील व गाडीत ठेवतील. ती गाडी ज्या ठिकाणी थांबेल तेथेच माझे मंदिर बांधण्यात यावे.
त्या ठाकराने घडलेला प्रकार सर्व ग्रामस्थांना सांगितला. अगदी दृष्टांताप्रमाणेच सर्व काही केले. अगदी अलगतच दोन व्यक्तींनी ती मुर्ती उचलली व बैलगाडीत ठेवली व ती गाडी न हाकता बैले चालू लागली. व बैले आज मंदिर आहे त्या ठिकाणी थांबली. व त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले तो कालखंड होता दिडशे वर्षा पुर्वीचा. ठाकराला दृष्टांत दिला म्हणून मंदिराचे नाव ठाकुरद्वार मंदिर असे देण्यात आले. आहे की नाही कथा विचार करण्यासारखी?
मंदिराच्या दक्षिणेस सती मंदिर, विहिर व समाधी आहे. पश्चिमेस कल्याणपेठ लेंडीनाला आहे. पुर्वेस भास्कर घाट व स्मशान तर उत्तरेस कुकडी नदी. संपूर्ण परिसर शेतीने व हिरवाईचा शालू पांघरलेला आहे. सतीमंदिरांची रचना तर खास आकर्षित करते. येथील दक्षिणेला खोदलेली विहीर फक्त आणि फक्त देवस्नानासाठीच बांधली गेली असल्याचे समजले. यावर मोट किंवा कातडी चमड्याची वस्तू वापरणे बंदी होती. अनेक समाधीस्थळे ठिकठिकाणी विखुरलेली दिसतात. संपूर्ण परिसर सध्या विटभट्यांच्या विळख्याने व्यापलेला आहे. येथील मंदिराची रचना पेशवेकालीन ओळखली जाते व कातळातील मुर्तीची रचना ही मुर्तीकाराने जेंव्हा मुर्ती साकारायला घेतली तेंव्हा त्याच्या समोर इ.स.दुसऱ्या , तिसऱ्या शतकातील लेणीमधील पद्मपाणी यांच्या मुर्त्या नजरेसमोर ठेवून बनविली असावी. अशा मुर्त्या 16 व्या 17 व्या शतकातील भगवान बालाजी ,विष्णु ,केशव ,हरी ,,म्हणूनच महाराष्ट्रात अशा मुर्त्या ओळखल्या जातात अनेक जून्या मंदिरात ह्या पाहयला मिळतात.मुर्तीच्या खालच्या हातात चक्र आणी गदा स्पष्टपणे दिसत आहेत. हीच आठ फुटाची मुर्ती बुलढाणा जिल्हातील मेहकर येथे भव्य मंदिरात आहे. मित्रांनो कधी जुन्नर मध्ये असाल तर या मंदिरास धावती भेट द्यायला विसरू नका.
श्री क्षेत्र हटकेश्वर देवस्थान – गोद्रे, ता. जुन्नर जि. पुणे ( महाराष्ट्र )
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पुनीत झालेल्या आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये हटकेश्वर डोंगराच्या कुशीत वसलेल्या व जुन्नर शहराच्या उत्तरेला ८ किमी अंतर असलेले एक आदिवासी ८ – ९ वाड्यांचे गाव म्हणजेच – गोद्रे.जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावाच्या भूमीला देखील अगदी अनादी कालापासून धार्मिक परंपरा आहे. या गावातील डोंगरावरील अत्यंत पवित्र व जागृत महादेवाचे देवस्थान म्हणजे अर्थातच ||” श्री *क्षेत्र* हटकेश्वर “||
संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे ” ना तरी काखेसुनि वसुंधरी | जैं हिराण्यक्षु रिगाला विवरी || ते उघडले हटकेश्वरी | जेवी पातळ कुहर || ” ( संदर्भ : ज्ञानेश्वरी – अध्याय 11 ओवी क्र.360) ज्ञानेश्वरी सारख्या धार्मिक ग्रंथात श्री क्षेत्र हटकेश्वराची महती वर्णली आहे परंतु काळाच्या ओघात पवित्र असलेले हे जागृत महादेवाचे देवस्थान अर्थातच तिर्थक्षेत्र ” हटकेश्वर ”; परंतु अद्याप प्रसिध्दीच्या झोतापासून पूर्णपणे दुर्लक्षित राहिले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्तीभावाने श्री शंभूमहादेव हटकेश्वराच्या दर्शनास येतात. विशेषतः महाशिवरात्री ला मोठी यात्रा भरते. आजू बाजूच्या खेड्यांतील भाविक मोठ्या संख्येने येथे दरवर्षी भक्तिभावाने अभिषेक व दर्शना साठी न चुकता येतात. या तीर्थक्षेत्राची महती सांगायची म्हणजे महादेवाने या स्थानी ध्यानस्त बसून हटकेश्वर नामक लिंगाची स्थापना केली त्याचा अंकुर सप्तपातळे भेदून गेला व रूपाने स्थिर झाला ते आजचे श्री क्षेत्र काशिविश्वनाथ आणि त्याच्या पादुका म्हणजेच श्री क्षेत्र हटकेश्वर होय. ( संदर्भ: काशिखंड-अध्याय क्र.77- अगस्ती ऋषींना कार्तिकस्वामी यांनी सांगितलेली माहिती) म्हणूनच की काय या परिसरातील भक्त भाविक हटकेश्वराच्या दर्शनास काशीक्षेत्राचे पुण्य मानतात. हटकेश्वराच्या दर्शनाने काशीक्षेत्राच्या दर्शनाची प्राप्ती होते. काशीखंड, दासबोध व स्कंदपुराण या ग्रंथामध्येही त्याबाबत माहिती वर्णिलेली आहे. अहो, येथील “वास्तूपाद” जलकुंडात तिर्थस्नान केल्याने शारिरीक दोष दूर होतात त्याचबरोबर येथील जलाच्या शिंपडण्याने किंवा सेवनाने वास्तूदोषही दूर होतात. (संदर्भ : स्कंदपुराण, नागरकथा – 132) एकूणच हटकेश्वर हे अतिप्राचीन महादेवाचे पवित्र व जागृत असे देवस्थान आहे.
हटकेश्वराच्या डोंगरावरून आजूबाजूच्या परिसराचे दृश्य अतिशय सुंदर, मनमोहक व नयनरम्य विलोभनीय दृश्य चहोबाजूला दिसते. उत्तरेला पायथ्याशी पिंपळगाव जोगा धरण, पश्र्चिमेला शहाजी सागर, दक्षिणेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण किल्ले शिवनेरी व अष्टविनायकां पैकी एक लेण्याद्री गणपतीचे स्थान असलेली गिरीजात्मक पर्वत रांग. पावसाळयात चहोबाजूला दिसणारे ते अप्रतिम विहंगम दृश्य याचे वर्णन करणे अशक्यच आहे. ती दृश्ये प्रत्यक्ष् आपल्या मंनचक्षूं मध्ये साठवून ठेवण्याची मजा काय औरच म्हणावी लागेल. हिरवागार शालू पांघरून नटलेली वनश्रुष्ठी, दूधसागरा प्रमाणे धोधो वाहणारे धबधबे, ओढ्या नाल्याना आलेला महापूर, हे सर्व वर्णन करणे खरंच कठीण आहे ते तेथे जाऊन प्रत्यक्ष् बघण्यातच खरी मजा आहे. हटकेश्वराचा डोंगर म्हणजे पर्यटकांसाठीचे वरदान. या डोंगरावरील मुख्यत्वे आवर्जून पाहण्या सारखी ठिकाणे म्हणजे जुनामहादेव, पड्या हौद, नैसर्गिक पुल तथा नवरानवरीची गाठ, व-हाडी डोंगर, महादेव मंदिर, वास्तूपाद तिर्थ, साळुंखी गुहा तथा कुहर, गणपती कुहर, डोंगराचे सर्वोच्च टोक – पाणगा, घोडे पाऊल, ढोल्याचे पाणी , इत्यादी. हटकेश्वर डोंगरावरील काही भागास असलेली नावे:- आंबेझाडी, चूल, टिवय, याहळमाची, चौरा,कवाडदार,आंदरई,कावडा,लहान कावडा,भसरंड,बांध,अल्हादयांचा कडा, सादरमाळी, भरंमखाच, चिलीमखडा, पाणगा, गिधाडाची नळी, म्हतारीचा काप, भागडी, हत्तीचा गळा, माळी,आडवी माळी, लिंगी , पांढरकडा, घोडीधार,गुरांची नळी,देवाची वाट,आडव इत्यादी नावे आहेत.
फाटकातून आत गेल्यावर मंदिराची घरवजा वस्तू दिसते.
मंदिराच्या कळसाचे इथून दर्शन होते.
कळस, मंदिराच्या मागील बाजूने ...
कळसावर काही सुंदर शिल्प कोरलेली आहेत.
मंदिराच्या घर वजा दर्शनी भागातील किंचित बसक्या दारातून आत गेल्यावर एक भली मोठी ओसरी आहे. ओसरीला लोखंडी गज असलेली कमान आहे. ह्या गजापलीकडे आहे मुख्य मंदिर.
मुख्य मंदिरासमोर पाण्याचे कुंड आहे. पाण्यात मंदिराचे प्रतिबिंब घेण्याचा प्रयत्न केला. शिखर पूर्ण बसेना म्हणून प्रतिबिंबावर फोकस केला.
डावीकडून मंदिराच्या मुख्य भागाकडे प्रवेश केला. शिवमंदिराच्या समोरील नंदीमंडपातून सुरेख दिसले मुख्य मंदिर!
शिवलिंगाचे दर्शन घेऊन निघताना नंदिशिल्प आणि मंडप इतके सुरेख दिसले. गणेश प्रतिमेने त्याचे सौंदर्य खुलून आले.
नंदी मंडपासहित मुख्य मंदिराचे दृश्य
पुष्करिणी
कीर्तीमुख आणि गणेश प्रतिमा असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारातून गाभाऱ्याचे दर्शन
मंदिराच्या अंतराळात आहे कासव प्रतिमा, गणेश आणि शिवपार्वती.
गाभाऱ्यात आहे पिंड/लिंग रहित शाळुंका आणि पार्वती मूर्ती
पिंड/लिंग विरहीत पन्हाळीसहित शाळुंका विस्मयाने पाहतच राहिले.
का असावे असे? पंचलिंग मंदिर म्हणताना लिंग विरहीत शाळुंकेला पंचलिंग का म्हणावे?
वाचण्यात आलेली माहिती: शिवमूर्तींबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांच्या 'भारताची मूर्तीकला' या पुस्तकात शिवाच्या मूर्तीबद्दल पं. जोशी म्हणतात, " शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा केल्यासारखे होते.
ह्या मंदिरात तर पन्हाळी सहित शाळुंका आहे, पार्वतीची पूर्ती देखील आहे परंतु शिवलिंग नाही. इथे शिव अभिषेक होतच नसावा का?
असे अनेक प्रश्न निर्माण झाले खरे, परंतु नंतर वाचनात आले कि हि पिंड स्वयंभू आहे. दिसताना एकच दिसत असली तरी पिंडीचा मध्यभाग खोलगट आहे. ह्या खोलगट भागात पाच पिंडी कोरल्या आहेत. म्हणून हे पंचलिंग मंदिर!
नाना फडणवीसांचे मेहुणे शिवनेरीचे सुभेदार होते. त्यांनी इ.स. १७७७ साली पूर्वाभिमुख दगडी थाटातील हे पंचलिंग मंदिर बांधले असे वाचनात आले.
श्रावण महिन्याच्या दर सोमवारी ह्या शिवालयात परंपरागत तांदळाच्या सुबक पिंडी केल्या जातात. ही परंपरा साधारण २०० वर्ष जुनी आहे.
हेमाडपंथीयांची नगरी म्हणजेच जुन्नर तालुका.
जुन्नर तालुक्यात असलेली खिरेश्वर, नागेश्वर, ब्रम्हनाथ, ही तीन हेमाडपंती मंदिरे अस्तित्वात असून माणकेश्वर, जुन्नर शहरातील अनेक ठिकाणी अस्तव्यस्त पडलेले कोरीव हेमाडपंथी शिल्पकलेचे दगड, ओतुर गावात तसेच कपर्दिकेश्वर मंदिर असे अनेक तालुक्यात हेमाडपंथी बांधनितील उदाहरणे देता येतील अशी ठिकाणे आहेत.
या मंदिराची निर्मिती दर्या खोर्यात केली असून नाशिक,त्र्यंबकेश्वर ते भिमाशंकर मंदिराच्या मधील सह्याद्रीच्या रांगात ही निर्मिती केली गेली आहे. सर्वात जास्त मंदिरे मध्यवर्ती ठिकाण व पुरातन व्यापारी मार्ग म्हणुन ज्या तालुक्याचे नाव प्रथम घेतले जाते तो तालुका म्हणजेच शिवजन्मभुमी जुन्नर तालुका होय.
हरिश्चंद्राची भेट घेऊन पुष्पावती माई धाकटी बहिण मांडवीला भेटायला निघते. द-याडोंगर खोरे तुडवत तुडवत व वेडीवाकडी वळणे घेत घेत ती जेव्हा जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथे येते तेव्हा तीची भेट मांडवीशी होते. एकमेकींना भेटून झाल्यावर पुष्पा, मांडवीला विचारते अग तु कोठे निघालीस एवढे नटून थटून? मांडवी उत्तरते मोठ्या ताई कुकडीला भेटायला निघाले. येतीस का ताई तु पुढे? पुष्पा म्हणते अग मी मोठ्या ताईलाच भेटायला निघाले होते. म्हटले रस्त्यात तुला भेटून पुढे कुकडी ताईला भेटावे. मग काय पुष्पा व मांडवी दोघी मोठी बहीण कुकडीला भेटायला निघतात. बरेच अंतर चालत चालत त्या एका ठिकाणी कुकडीला भेटतात तेच ठिकाण म्हणजे जुन्नर तालुक्यातील लालखण हिवरे होय.
त्यांची भेट ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणास आपण संगम असे म्हणतो. या ठिकाणी तीन नद्या एकत्र आल्याने येथे हेमाडपंती संगमेश्वराचे मंदिर बांधण्यात आले होते. संपूर्ण मंदिर जमीनदोस्त झाल्याने मंदिराबाहेरचे चार नंदी पहावयास मिळतात. हेमाडपंती मंदिराचे अवशेष पालथे असून फक्त एक मुर्ती निदर्शनास पडते. गणपती शिल्प जीर्ण अवस्थेत पहावयास मिळते. या ठिकाणी येण्यासाठी आज प्रथतःच कपडे उतरून छातीभर खोल पाण्यातुन 30 मीटर प्रवास करावा लागला तेव्हा कुठे येथील शिवलिंगास स्नान घालण्याचा व स्वच्छ करण्याचा योग आला.
आता आपणास प्रश्न पडला असेलच कि लालखण हे नाव कसे? यावर भोर बाबा आख्यायिका सांगतात की खुप खुप वर्षापूर्वी अहमदनगर मधील लालखण बाबांच्या समाधीपाशी असलेले दोन अतिशय लाल व मोठे भुंगे फिरत फिरत येथे आले व मरण पावले. त्यांची समाधी लालखण म्हणुन येथे बांधण्यात आली. ते भुंगे येथे बाबाच्या रूपात आले होते म्हणून तसे नाव देण्यात आले. #लालखण_मंदिर ही वास्तु बहुतेक निजामशाही कालखंडात बांधण्यात आली असावी असे वाटते. मंदिरात एक व मंदिराच्या बाहेर पश्चिमेस लागुन एक अशी दोन पिरस्थाने पहावयास मिळतात. नुकतीच 4 तारखेला मंदिर पाण्याची पातळी कमी झाल्याने येथे यात्रा संपन्न झाली होती.
याच समाधीच्या अगदी दक्षिणेला 30 मीटर अंतरावर भारताचे सर्वप्रथम वनसंरक्षक इंग्रज अधिकारी गिब्सन येथे सरकारी बंगल्यात वास्तव्यास होते. धरण निर्माण झाल्याने त्यांचे राहते घर पाण्याखाली गेले व त्याची पडझड मोठ्या प्रमाणात झाली व आज फक्त त्या इमारतीचे अवशेष पहावयास मिळतात. येथे विविध ठिकाणी समाधीस्तल पहावयास मिळतात. आखीव व रेखीव सुंदर तुळस येथील पसरलेल्या हिरवाईमधे तल्लीन होऊन उभी असल्याचे दिसते. बौद्ध समाधी याच तुळशीच्या पुर्वेस पहावयास मिळते. परंतु ती बौद्ध समाधी नसून समाधीस्तल असावे की जीच्या छतावर चुन्यामध्ये चारही दिशांना बसलेल्या अवस्थेतील मुर्ती कोरलेल्या दिसतात.
धरणाची पातळी खाली गेली की येथील ग्रामस्थांच्या पुर्वीच्या आठवणी ताज्या होऊ लागतात. सर्व बाजुंना लाबवर हरळीच्या गवताचे साम्राज्य पसरल्याने हा परिसर हिरवाईने व सौंदर्याने नटलेला पहावयास मिळतो. एकदा का या परिसरात आलात तर येथून निघता पाय काढणे फारच कठीण. ओझरच्या विघ्नहर्त्याच दर्शन झाले की पर्यटकांनी हिवरे बुll या गावातील या ठिकाणी भेट देणे सोयीस्कर आहे. अगदीच तीन कि.मी अंतरावर हे गाव आहे. गाव परिसर संपूर्ण उस क्षेत्राने अच्छादीत असल्याने येथील रस्ते नेहमीच हिरवाईच्या छायेत असतात. येथील सौंदर्य दर्शन जर सांजवेळी घेत असाल तर अतिउत्तम कारण सुर्यमावळतीचे दृष्य तर अप्रतिमच. मग पहातायना #हिवरे_बुll परिसर?
वडज खंडोबा देवस्थान.(जुन्नर)
जुन्नर शहराच्या दक्षिणेस 6 कि.मी अंतरावर माता मिना नदिच्या दक्षिण किनार्यावर वसलेले ऐतिहासिक व सर्व गुण संपन्न गाव म्हणजेच “वडज” गाव होय. या गावला नावलौकिक प्राप्त झाला तो येथील गावच्या उत्तरेस असलेल्या भंडार्या डोंगराच्या पुर्व भागात एका जोगधावा नावाने प्रसिद्ध असलेल्या व डोंगर कपारीत पालीच्या खंडोबाच्या स्थापित पादुकांमुळे. दुसरे नावलौकिकास पात्र असलेले व मिनामाईला अडवून सुजलाम सुफलाम करणार्या शेतकरी वर्गाला वडज धरणामुळेही या गावच्या कारकिर्दीस चांगलाच उजाळा मिळाला आहे.
या गावातील जुने जिर्ण व पडझड झालेले वाडे आजही पुरातन ऐतिहासिक वारसेची आठवण करून देतात. अशा या गावात मुळचे कर्हाड, सातार्याचे रहिवासी असलेले चव्हाण कुटूंब येथे राहण्यासाठी आले. हे कुटुंब मुळातच धार्मिक वृत्तीचे असल्याने व आपल्या कुलदैवताची येथुन पूढे जाग्यावर जाऊन सेवा करता येणार नाही, म्हणून त्यांनी कर्हाड, सातार्याहून येताना आपले कुलदैवत असलेल्या पालीच्या खंडोबाच्या पादुका ते घेऊन आले होते. या पादुकांची प्रतिस्थापणा भंडार्या डोंगरावर असलेल्या कपारीत करण्यात आली. कारण मुळातच खंडोबा हे डोंगरदर्यामध्ये फिरणारे असल्याने तेथेच त्यांची जोगधावा म्हणुन स्थापना करण्यात आली.

सदानंद चव्हाण रोज सकाळी 3 वा उठून मिना मातेच्या पात्रात अंघोळ करून नित्यनियमाने देवाची भक्ती भावे पुजा करू लागले. देवाचा जवळचा व नित्यनियमाचा भक्त म्हणून त्यांची ख्याती पंचक्रोशीत पसरू लागली. गावातील व पंचक्रोशीतील समाज पण देव पुजा श्रध्देने व भक्ती भावाने करू लागले. देवापुढे आपल्या समस्या मांडू लागले व त्यांच्या समस्या सुटू लागल्या, व त्यामुळे लवकरच हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले. ही ख्याती दुरवर पोहचण्यास वेळ लागला नाही. हळू हळू यात्रा, उरूस येथे साजरा होऊ लागला. परंतु देव पुजारी सदानंदाचे आता खुपच वय झाले होते. दिसायला व ऐकायलापण कमी झाले होते. पायांची गती मंदावली होती. परंतु देव भक्तीची भुक कमी होत नव्हती. दिवसभर हळु हळू चालत चालत ते संध्याकाळपर्यंत पोहचत असत व रात्र तेथेच काढत असत. शरिर साथ सोडू लागले होते. आज ते पुजा करुन भगवंताला विनंती करू लागले,की मला आता तुझ्या भक्तीची खुपच चिंता भासत आहे. मला तुझी पुजा येथपर्यंत येऊन करने शक्य होणार नाही. याच विचारात मी रोज खचलो जाऊ लागलो आहे. तुझ्या भक्ती वाचून माझा दिवस जाऊच शकत नाही. मी काय करू? जीव अगदी कासावीस होऊन जातो. सदानंदने आपले गार्हाणे भगवंताला बोलून दाखवले. व हळु हळु आपल्या पडझड झालेल्या झोपडीकडे मार्गस्थ झाले. सदा चालून चालून खुप थकलेला होता. सकाळी निघालेला सदा रात्री घरी पोहचला. आज तो दिवसभर उपाशीच होता व रात्री थकावट घालावी म्हणुन तेथेच झोपडीत जमीनीवर आडवा झाला ते ही काही न खाताच.
आज चम्पाषष्टीचा दिवस होता. सदा गाढ झोपेत होता. खंडोबाच्या स्वारीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला.
देव बोलु लागले. सदा उठ, मी तुझी काळजी दुर करायला आलो आहे. मला माहीत आहे की तु माझ्या भक्तीचा किती भुकेला आहेस. तु माझ्या भक्ती पोटी प्राण देण्यासाठी पण मागे फिरणार नाहीस. तुझी काळजी ती आता माझी काळजी आहे. तु उद्या जेव्हा पुजा करण्यासाठी येशील तेव्हा मी तुझी पुजा झाली की तुझ्या पाठी पाठी कायमचाच तुझ्या घरी येणार आहे,फक्त एक लक्षात ठेव तु जेव्हा जोगधाव्यापासुन परतिला निघशिल तेव्हा तु घरापर्यंत मागे बघू नकोस. व नंतर तु माझी तेथेच घरी पुजा करायची. तुला कुठे जाण्याची अवश्यकता पडणार नाही. हे सांगुन देव निघुन गेले. सदा दचकून जागा झाला. सकाळचे तीन वाजले होते. सदाने नित्य नियमाचे पालन म्हणून पुन्हा भंडार्या डोंगराकडे चालण्यास सुरूवात केली. आज त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या आनंदाच्या भरात तो सोळा वर्षांचा होऊन चालू लागला होता. अगदी अर्ध्या तासात मीना मातेच्या पवित्र पात्रात स्नान करून सदा जोगधाव्यापाशी पोहचला होता. सर्व संपन्न पुर्ववत पुजा अर्चा करून तो घरच्या परतीच्या मार्गाला लागला. तो जस जसा पुढे चालु लागला तस तसा घोड्यांच्या टापाचा, घुंगरांचा आवाज सदाच्या कानी येऊ लागला. सदा या आवाजाने आजुनच गदगदित झाला होता. त्याच्या उत्साहाला सिमाच उरली नव्हती. या आवाजाने व भगवंताचा जास्त वेळ सहवास लाभेल म्हणून तो अगदी रमत गमत चालला होता. मना मध्ये कधी कधी भगवंताला पाहण्याची लालसा भेडसावत होती. परंतु मागे पाहू नये ही भगवंताची आज्ञा होती. घोड्याच्या खिंकाळीने त्याचे भान पुन्हा जाग्यावर येत होते. साधारण जोगधावा ठिकाणापासून सदा वडज गावाच्या दिशेने 1 कि.मी अंतर चालुन आला होता. आज सदाच्या शरीराला शक्ती मातेने शक्ती व बळ प्रदान केले होते, म्हणूनच की काय त्याला थकवा जाणवत नव्हता. रोज थोडा वेळ विसाव्यासाठी सदा ज्या वृक्षाचा आधार घेत असे तो बोरीचा वृक्ष समोरच 10 ,12 फुटावर होता, परंतु भगवंताला एकदातरी वळुन पाहण्याचे काहुर सदाच्या मनात माजल होत. हळु हळु पावले टाकत सदा चालला होता. बोरीचा वृक्ष मागे टाकत सदा 12, 15 पावले पुढे चालून गेला असेल नसेल तेवढ्यात भगवंताला एकदा पाहण्याची लालसा सदाला तीव्र झाली व त्याने मागे वळून पाहीले. तेवढ्यात बोरीच्या वृक्षाच्या खोडाचा अत्यंत मोठा कडकड आवाज झाला व भगवंत त्या वृक्षात गुप्त झाले. भगवंताने सदानंद ला दृष्टांत दिला होता की तुझी भक्ती पाहून मी एवढा खुष झालो आहे की भक्त माझे नाव घेण्याआधी तुझे नाव पहीले घेतील. म्हणून आपण आज केव्हाही खंडोबा देवदर्शन साठी जातो तेव्हा सदानंदाचा येळकोट असे उच्चार करतच देव दर्शन घेत असतो. अशी कथा येथील भक्त सांगत असतात.
बोरीच्या वृक्षात भगवंत गुप्त झाल्यानंतर येथील भाविक येथे दर्शनासाठी येऊ लागले. येथे एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले. हळु हळु या मंदीराचा जिर्णोध्दार होत गेला. सन 1825 ते सन 1877 पर्यंत ग्रामस्थ,देणगी निधी व देणगी धान्य कोठाराच्या माध्यमातून मुस्लिम व मराठी गवंड्यानी आपल्या छन्नी हातोड्याच्या बळावर 51 वर्षे सतत काम करून एक आखीव व रेखीव असे सुंदर मंदिर निर्माण केले. आजही मंदिराची रंगरंगोटी व हस्तकला पाहण्या व वाखाणण्या योग्य आहे. आजही तो बोरी वृक्ष सदाच्या भक्तीची व सदाच्या विश्रांतीची साक्ष देण्यासाठी मंदिराच्या समोर उभा आहे. व आजही ते धान्य कोठार मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी मदत करणारे होत आहे.
मंदिराचे काम सुरळीत व चांगले चालण्यासाठी सन 1966 मध्ये खंडोबा देवस्थान ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सन 1976 साला पासुन मंदिराच्या आवारात लग्न कार्याची सुरूवात करण्यात आली. व आज पर्यंत 16,000 (सोळा हजार) विवाहाची साक्ष व जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त विवाह सोहळे आयोजन करण्यात आग्रेसर असलेले हे तालुक्यातील एकमेव मंदिर आहे.
माघ पौर्णिमेला फेब्रुवारी महिन्यात येथे सर्वात मोठा यात्रोत्सव साजरा केला जातो. तसेच चम्पाषष्ठी व दसर्याला येथे यात्रा, सहा दिवसाचा सप्ता व रात्रोत्सव साजरा करण्यात येत असतो.जुन्नर तालुक्यातील वडज खंडोबा मंदिरात दडलय लाख मोलाचे सोने.
मित्रांनो वडज खंडोबा मंदिराच्या जिर्णोध्दारात त्याची मुळ प्रतिमा धुळीस मिळाली. सिमेंटचा लेप देऊन त्यांचे पौराणिकत्व लुप्त झाले. आज पाहणारा या मंदिराकडे एक नवनिर्माण मंदिर म्हणुन पाहतो खरा परंतु हा लेप जर काढला तर भिमाशंकराच्या मंदिरानंतर दगडी तोडीतील सर्वात मोठे मंदिर म्हणून हे पुन्हा उदयास येऊ शकते. असो.
या मुख्य मंदिराच्या बाहेर दक्षिणेस एका झाडाखाली असलेले शिल्प मात्र लक्ष वेधून घेते. हे शिल्प जवळपास फक्त याच ठिकाणी दिसून येते. लेण्याद्रीचा गिरिजात्मज व ओझरचा विघ्नहर्ता या ठिकाणी हे शिल्प असायला हवे होते परंतु ते येथे कसे? हा प्रश्न पडतो. कारण हे शिल्प आहे ते गणेशाच्या असणाऱ्या दोन पत्नी रिद्धी आणि सिध्दी यांच्या समवेत. यावरून गणेशाच्या परिवारातील झाले ला प्रकार आपणास माहितच आहे. गणेशाच्या लग्ना आधी शंकर पार्वतीने मुलांचा वाद मिटविण्यासाठी लग्न कुणाचे आगोदर होणार यावर उपाय म्हणून पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण जो करेल त्याचे लग्न आधी होणार ही युक्ती शोधून काढली व गणेशाच्या चातुर्याने आपल्या वेद आणि शास्रात जो कोणी आपल्या मातापित्यांना प्रदक्षिणा घालेल त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळेल आणि तुम्ही जर हे अमान्य कराल तर तुम्ही वेदसुध्दा अमान्य करता आणि तुमचा अवतार सुद्धा. हे जेव्हा मातापित्यांना सांगितले तेव्हा याच रिद्धी, सिद्धीशी गणेशाचा विवाह संपन्न झाला. आज तेच शिल्प म्हणजे पौराणिकतेचे लाख मोलाचे सोने येथे पहायला मिळाते.
तसे जर पाहीले तर प्रदेशानुसार श्रीगणेशांच्या पत्नी बदललेल्या दिसतात. उत्तर प्रदेशात त्या रिद्धी सिद्धी म्हणुन ओळखल्या जातात आपल्याकडे विवाहित आणि दोन पत्नी असणारा गणेश मात्र दक्षिणेत ब्रम्हचारी आहे. तरी पण दक्षिणेकडे अनेकदा त्या सिध्दी, बुध्दी असतात व त्या गणेशाच्या सकारात्मक शक्ती मानल्या जातात.
मंदिराच्या बाहेर प्रदक्षणा पुर्ण करत जेव्हा बाहेर पडलो तर आजून एक आश्चर्य दिसते. नाणेघाटात असलेला दगडी रांजण मोठा आहे परंतु त्याच्यासारखाच परंतु छोटा रांजण येथे पहावयास मिळातो. तो कधी कोरला गेला असावा? तो येथे ठेवण्यात का आला असावा? येथेही जकात वसुली केली जायची का? या मंदिराचा इतिहास नाणेघाटाशी निगडीत तर नाही ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. याचे संशोधन करणे गरजेचे आहे. आणि खरच हे मंदीर या गोष्टीचा उलगडा करेल का? हा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीचे हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर.
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी पुणे – नाशिक हायवेपासुन अगदीच दोन कि.मी अंतरावर पश्चिमेस वसलेले हे गाव. गावाला असे नाव का पडले असावे असा प्रश्न पडतो व विचारधारा सुरू होते ती या नावाच्या शोधाची. जुन्नरवरुन उंब्रज, काळवाडी मार्गे पिंपळवंडी असा प्रवास करता येतो. हा सर्व परिसर येडगाव धरणाच्या पाणलोटाखाली असल्याने येथील सुंदरतेला तर चार चांद लागलेले दिसतात. गावाच्या पाठीमागे पश्चिमेस एक 100 मी. अंतरावर पिंपळेश्वर ओढा लागतो. या ओढ्याच्या काठी एक हेमाडपंती मंदिर दृष्टीस पडते. येथील परिसर अनेक पिंपळ वृक्षांनी व्यापलेला दिसतो व नकळतच काशीखंड अध्याय – 50 मधील ओव्या आठवू लागतात.कुसुर मधिल अप्रतीम कलाकुसर असलेले मारूती मंदिर.
जुन्नर तालुक्यातील हे एकमेव दगडी कोरीव तोडी व उत्कृष्ट लाकडी कोरीव नक्षी व जुन्या पद्धतीचे बांधलेले व तग धरून असलेले एकमेव मंदिर असाव. कधी किल्ले शिवनेरीला आलात तर नक्कीच या मंदिराला हल्की भेट देऊन या देव दर्शनाचा आपण आनंद घ्याल हीच सदिच्छा.
आंबेगाव तालुक्यातील नागापूर जवळ असलेला थापलिंगचा खंडोबा हा पंचक्रोशीतील सर्वच कुटुंबियांच कुलदैवत आहे. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्याचे श्रद्धास्थान म्हणुन नावलौकिक असलेल्या या खंडेरायावर जीवापाड प्रेम करणारे येथील भक्तगण जानेवारी महिन्यातील पौर्णिमेस मात्र दरवर्षी कुटूंबानिशी यात्रेत न चुकता भंडार खोबरे उधळण्यासाठी हजर असल्याने या परिसरास कुंभ मेळ्याचेच स्वरूप प्राप्त होते व हा परिसर भंडारा उधळल्याने सोनेरी रूपात दर्शन देऊन जातो. आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावास लौकिक प्राप्त झाला तो या खंडेरायाच्या पाऊल स्पर्शाने व वास्तव्याने. घोड नदीच्या उत्तर किना-यावर वसलेले हे छोटे शेतीप्रधान परिपूर्ण गाव. या गावच्या दक्षिणेस अगदी अर्ध्या कि.मी अंतरावर एक छोट्याश्या डोंगरावर या खंडेरायांच जागृत देवस्थान अगदी सहज निदर्शनास पडत. पावसाळ्यात तर ही डोंगरांग जेव्हा हिरवाईचा शालू नेसते तेव्हा म्हाळसा जणू खंडेरायास नटून थटून भेटण्यासाठीच आली आहे की काय असा भास होतो.
जुन्या बांधणीचे हे मंदिर असून खंडोबा व म्हाळसाच्या गाभार्यातील मुर्ती भक्तांना आशिर्वाद देताना दिसतात. जेजुरीच्या खंडेरायाला ज्या भाविकांना जाणे शक्य होत नाही तेव्हा तेच दर्शन येथे घडते. बाहेर उभी असलेली दिपमाळ येथील पौराणिक इतिहासाची आठवण करून देते. यात्रेतील दुकानांसाठी बांधलेले ओटे, भक्त निवास व टोलेजंग मंदिर वेस येथील सुंदरतेत अजूनच भर घालते. नागापूर ग्रामस्थांनी येथील निसर्ग देवतेला फुलवण्यासाठी सोनचाफा आदि वृक्षलागवड गडावर केल्याने अभिमान वाटतो कारण कोणत्याही देवस्थानापाशी आपण जातो तेथे देवराई ही हमखास असायची परंतु ती निर्माण करण्याचे काम हाती घेतल्याचे जानवले.
गडाच्या पुर्वेला जवळच भिमाशंकर सहकारी साखर कारखाना येथील परिसरास गोडी निर्माण करत असून गडाच्या पश्चिमेस पायथ्याशी जागतीक महादुर्बिण विज्ञानात मानवाच्या प्रगतीचे पुरावे दर्शवित आहे. अशा या नयनरम्य वातावरणात एक फेरफटका व देवदर्शन घेण्यासाठी थोडा वेळ काढा व कुटूंबातील सर्वांना येथील भुमीचे दर्शनासाठी घेऊन जा.
बोला येळकोट येळकोट जय मल्हार.
सदा आनंदाचा येळकोट
नरसिंह देवस्थान रांजणी (आंबेगाव)
पुणे जिल्ह्य़ात एकमेव असलेले आंबेगाव तालुक्यातील नरसिंह मंदिर हे असून येथे पुण्याहून नाशिक महामार्गावर मंचर येथून रांजणी येथे जाण्यासाठी फाटा आहे. साधारण मंचर येथुन चांडोली, थोरांदळे, कारफाटा व रांजणी असे 14 किमी अंतर कापत रांजणी या गाव पोहचावे. हे गाव आंबेगाव तालुक्यातील पुर्व पट्यात असल्याने सपाट भू-भागाने व्याप्त असल्याने येथे जाण्यासाठी चांगले रस्ते असून हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे. या गावाला व मंदिराला मिना नदिचा किनारा लाभल्याने येथील शेतकरी प्रगतशील असून विविध प्रकारचा शेतीव्यवसाय येथे पहावयास मिळतो. गावातील ग्रामस्थांच्या ऐक्याने येथील परिसराला नवलाईचा शालू नेसवलेला आपल्या दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाही. अशा या नैसर्गिक वातावरणात गावच्या पश्चिमेस प्रचंड सुंदरतेने नटलेले व भक्त प्रल्हादाच्या भक्तीने मोहून टाकण्या-या व आपल्या वेगळ्याच रूपात प्रकट होऊन भक्ताच्या मदतीला धावून आलेल्या भगवान नरसिंहाचे सुंदर मंदिराचे व देवाचे दर्शन घडते. गावक-यांनी जुनं ते सोन या म्हणीला येथे प्रत्यक्षात साकार करत या मंदिराला आहे त्या स्थितीत संवर्धित करून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. म्हणूनच आपणास सभा मंडपातील असलेले लाकडी नक्षीकाम कारागिराने किती चातुर्याने केले होते तो पुरावा पहावयास मिळतो. बाह्य मंदिराला केलेल्या रंगरंगोटी व लेपामुळे या मंदिराची पौराणिकता लुप्त झाली आहे.साधारण सतराव्या शतकात नाना फडणविसांनी हेमाडपंती बांधणीच्या पद्धतीचा अवलंब करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला व नदीच्या घाटाचीही बांधणी केली, असे सांगितले जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश निषेध असल्याने गाभाऱ्यात केलेल्या दगडी शिल्पांचे वर्णन आपणास सांगू शकलो नाही या बद्दल खेद व्यक्त करतो. परंतु गाभार्याच्या प्रेवशव्दारावर जिर्ण झालेले गणपती शिल्प या मंदिराचा पुरातण इतिहास जागवताना दिसतो. ग्रामस्थ हे मंदिर पेशवे कालखंडाच्या आधीचे मंदिर असा उल्लेख करतात. याच मंदिरात भगवान मारूतीचे मंदिर असून कातळकोरीव मारूती मुर्ती सेंदुराने रंगवलेली असल्याने कोणत्या कालखंडात निर्माण केली गेली असावी हा तर्क करता येत नाही.
रांजणी येथे नरसिंह मंदिर निर्माण झाले तो इतिहास
रांजणी येथील रहिवासी लखोजी हे नरसिंह भक्तीत नियमित तल्लीन असत.भगवान भक्ती ने त्यांची तहान भूक हरपल्याने ते पायी चालत चालत नेहमी सोलापूर येथील टेंभुर्णी फाट्यावरून आत नीरा नरसिंहपूर येथील नरसिंह मंदिरात देवसेवा घडावी, देवाचे दर्शन व्हावे व हा मानव जन्म सार्थ व्हावा हीच त्यांची विचारधारा होती. त्यांच्या भक्तीकडे पाहून गावकरी त्यांना आवडिने महाराज म्हणत.
परंतु आता लखोजीचे पाय थकले होते. लखोजी नियमित चिंता सतावू लागली की यापुढे ही वारी आपणास वृद्धापकाळामुळे करता येणार नाही. माझे देवदर्शन होणार नाही. भगवंत माझ्यावर रागवणार तर नाही ना? अशा अनेक शंका कुशंकांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातले होते. काय करू ? कसे दर्शन घडणार माझ्या भगवंताचे? या विचाराने महाराज हवालदिल होऊन झोपी जात. आता तर त्यांचे डोळे खोल गेल्याचे स्पष्ट जानवत होते. खुपच थकलेले व अशक्त झालेले दिसत होते. आजही ते भगवंत दर्शनाचाच विचार कथा-कीर्तनात करत होते.कशातच त्यांचे मन रमत नव्हते. परंतु चेहर्यावर असलेले तेज आज जास्तच झळकत होते. त्यांना झोपेतही नृसिंहाचाच ध्यास लागला होता. त्यांचे दोन्ही डोळे बंद झाले होते. त्यांच्या निरोगी शरीरातून फक्त आणि फक्त श्वासाची होत असलेली हालचालच जानवत होती. ते अचानक दचकले मध्यरात्रीचा तो प्रसंग असावा बहूतेक तेव्हा लखलखाट झाला त्यांचे शरिर तेजोमय झाले व त्यांच्या आत्म्यास नरसिंहाने दृष्टांत दिला. भगवंत त्यांच्या आत्म्याशी बोलू लागले “तू आता नरसिंहपूरला येऊ नकोस. मी तुझी या त्रासातून सूटका करणार आहे. मी तुझ्या भक्तीवर एवढा प्रसन्न झालो आहे की मी तुझ्या सहवासात रांजणी गावी येत आहे.असे अभिवचन दिले.झोपलेल्या लखोजींच्या चेहर्यावर प्रसन्नता साफ झळकत होती.
आज लवकरच लखोजी उठले.नरसिंह भगवंताची पुजा अर्चना करत रांजणी गावची वाट धरली. शरिरात असलेला थकवा दूर पळाला होता. लखोजी १८ वर्षेच्या तरूणासारखे आनंदाने झपझप चालू लागले होते. त्यांना आज स्वतः वृध्द आहे हे पण आठवत नव्हते. रस्त्यात भेटणारी माणसे लखोजींकडे पाहून जगातील आश्चर्यकडे पहावे अगदी तसेच पहात होते. लखोजींचे लक्ष फक्त रात्री भगवंताने दिलेल्या दृष्टांताकडेच होते.चालून चालून आता रात्र झाली होती. लखोजींना कोठेही नाही थांबता रांजणी गावी पोहचायचे होते. संपूर्ण रात्र त्यांनी चालून पायाखाली घातली परंतु स्वारीला आपण दिवसा चाललोय कि रात्री काहीच माहित नव्हते. जेवण,पाणी सर्व काही विसरून गेले होते. आता सकाळचे तिन वाजले असावेत लखोजींनी रांजणी गाव हद्दीत प्रवेश केला होता. चार वाजता ते गावात पोहचले. गावच्या उत्तरेला असलेल्या मीना नदी पात्रात ते स्नानासाठी पायर्या उतरू लागले. गावातील इतर मंडळी तेथे स्नान करत होती. त्यांना बाजूला करत लखोजी उद्गरले बाजूला व्हा माझे भगवंत तेथे स्नान करत आहेत. काही क्षण गावकरी चिंताजनक नजरेने लखोजींकडे पाहू लागले. ते बाजूला झाले. लखोजींनी प्रथम स्नान केले. जवळच असलेल्या दोन गावकर्यांना जवळ बोलावले. शेजारीच पाण्यात गवताच्या अर्धवट जळत्या पेंढ्या पडल्या होत्या त्या बाजूला केल्या तर सर्वजण आश्चर्य चकित झाले. सर्वजण डोळे फाडून पाहू लागले की त्या ठिकाणी नृसिंहाची मूर्ती होती. लखोजींना दिलेला दृष्टांत खरा ठरला होता. त्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली, व लखोजी रोज नित्य नियमाने त्या मुर्तीची पुजा शरिरात प्राण असे पर्यंत करत राहिले. अशी अख्यायिका सांगितली जाते.
नरसिंहाची सुंदर बोलकी मूर्ती
उभ्या असलेल्या सिंहाच्या रूपातील ही मूर्ती अतिशय रेखीव असून पुढचे दोन पाय भू मातेवर टेकवून जणू भक्तांना आशिर्वादच देत आहेत व सांगत आहेत की मी तुमचा पाठीराखा आहे. मी सदैव भक्ताच्या संकटी धावून येण्यासाठी तयारच आहे. दगडी आयाळ शक्ती , लांब टोकदार दात शत्रुंचा काळ व लोंबणारी जीभ भक्तांना आशिर्वादच देत आहे असे वाटते. डोळे व नाकावर सोन्याचा पत्रा असल्याने चेहर्यावर चमक दिसते , तर भुवयांना मढवलेला चांदीचा पत्रा भक्तांसाठी प्रेमभाव दर्शवित आहे. मूर्तीच्या मागील बाजूला असलेल्या महिरपीवर सुंदर कोरीवकाम केलेले दिसते. त्यावर डाव्या बाजूस मोराची सुंदर प्रतिकृती असून, मध्यभागी नागाची व सिंहाच्या चेहऱ्याची शत्रुंचा नायनाट करण्यासाठी साकारलेली कोरीव प्रतिमा दिसते.
नरसिंह मंदिराची रचना
मुख्य सभागृहात लाकडी खांब असून, वरील मजला लाकडाचा वापर करून बांधलेला आहे. तेथेच नगारावादन केले जाते. मंदिरातच उजव्या बाजूस मारुतीची मूर्ती बसवलेली दिसते. मंदिराच्या पुढे मोठा सभामंडप असून, डाव्या बाजूला शंकराचे मंदिर आहे. अंगणात तुळशी वृंदावन आहे. मंदिरासभोवतीचा परिसर व समोरच घाटा शेजारी उभे असलेले चिंचेचे झाड जवळपास १५० ते २०० वर्षे जुने असावे व उन्हाळ्यात यात्रेकरूना थंडावा देत आहे. मीना माईच्या कृपाशिर्वादाने बाजूच्या परिसरात थंडावा निर्माण करत तो हिरव्यागार वनश्रीने नटलेला आहे.
मंदिराची व्यवस्था, पूजा-अर्चा, अभिषेक इत्यादी कामे मंदिर ट्रस्ट व ब्राह्मणवृंद करतात. नरसिंह जयंतीच्या वेळी (नरसिंहाचे नवरात्र) येथे मोठा उत्सव असतो. कथा-कीर्तन, वाचन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अभिषेक व दर्शनासाठी येथे भाविकांची गर्दी असते.
आज पर्यंत येथील एक आश्चर्य म्हणजे नरसिंह जयंतीला वरूणराजा गडगडाट करतच येथे बरसतो, पवनराजा वेगाने धावू लागतो, मोठ मोठाले वृक्ष आनंदाने हवेत डोलू लागतात व अशा या वातावरणातच नरसिंहाचा हजारो भक्तांच्या साक्षिणे जन्म होतो. हजारो फुले पाकळ्या उधळल्या जातात. वातावरण या पाकळ्यांच्या फुलांच्या सुगंधाने सुगंधित होऊन जाते.
ब्रम्हस्थान…
ब्रम्हस्थान…
घर असो, वाडा असो किंवा मंदिर असो. वास्तुशास्रानुसार घर,वाडा किंवा मंदिर या वास्तूचा मध्यबिंदू म्हणजेच त्या वास्तुचे ब्रम्हस्थान होय. या जागेस अगदी पुर्वी पासुन खुप महत्व दिले गेले आहे. या जागेवर कोणत्याही प्रकारचे वजन पडू नये, पाय पडू नये म्हणून आज मंदिरात त्या ठिकाणी कासव बसविण्यात येते व प्रत्येक जण या कासवाचे दर्शन घेत असतो. आपण अनेक ठिकाणी पाहीलेही असेलच की कासव देवतेच्या समोरच मध्यभागी असते. या मधील काल्पनिक रेषेवरून कधीच दर्शन घेऊ नये.
अनेक वर्षांनी किल्ले शिवनेरी वरील माताशिवाई देवी मंदिराच्या जिर्णोध्दराचे काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे या मंदिराच्या सभामंडपात उत्खनन सुरू केले व माता शिवाई देवीच्या सभामंडपात असलेले ब्रम्हस्थान उघडकीस आले. ब्रम्हस्थानाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले कोरीव दगडी शिल्प कि त्या शिल्पाची रचना एका घमेल्यासारखी केलेली असुन त्या भांड्यात दगडात कोरून पाण्याची एक पन्हाळी बनवून मातेच्या स्नानाचे पाणी त्या पन्हळीद्वारे एक छिद्र पाडून त्या ब्रम्हस्थानाच्या भांड्यात सोडण्यात आले आहे, कि ज्या पाण्याचा उपयोग अमृत तीर्थ म्हणून करण्यात येत असे. पुन्हा हे तीर्थ पुर्वेकडे एक छिद्र पाडून दगडी पन्हळीद्वारे काढून देण्यात आले आहे. कि जेणेकरून ते पाणी साठून राहीले जाऊ नये. व मंदिरात उग्र वास पसरू नये. हेच पाणी पुढे गोमुख कोरीव दगडी शिल्पातुन बाहेर सोडण्यात आले आहे.
पुर्वीच्या बांधकाम शैलीचे देखावे पाहताना खुप बारकावे जोपासले गेले तर त्यांचा उलगडा व बांधन्यापाठीमागचे उद्देश आपणास थोडेफार समजू लागतात. त्यासाठी निरीक्षण असणे आवश्यक आहे.
गावात जिल्हा परिषद शाळेला लागुनच 45 गुंठे वनक्षेत्र असलेल्या देवराई आहे. या देवराईवर सन.1986 मध्ये पुण्यातील एका संस्थेने संशोधन करून येथील औषधी वनस्पती व वृक्षांचा अभ्यास करून त्यावर एक पुस्तक प्रकाशित केले होते. एवढी अफलातून ही देवराई आहे. या देवराईची काळजी घेतली आहे ती या देवराईत असलेल्या भैरवनाथ देवतेने. या देवतेच्या मंदिराचा जिर्णोध्दार वनविभाग जुन्नर याच्याकडून करण्यात आला आहे. अतिशय आकर्षक असे भव्यदिव्य मंदिर बांधण्यात आले आहे. या देवतेची कथा येथील पुजारी शिवलिला या ग्रंथाच्या 12 व्या अध्यायाच्या माध्यमातून सांगतात.
मंदिरात असलेले शिवलिंग व समोर असलेले पौराणिक दगडी तोडीतील घडीव व कोरीव नंदी, पाठीमागे देवीच्या आकाराचे कोरलेले चतुर्भुज दगडी शिल्प व समोरील 12 फुट उंचीचा दिपस्तंभ येथिल पुरातन इतिहास जागवताना दिसून येतात. येथील ग्रामस्थ कोणत्याही प्रकारचे नवकार्य करायचे असेल तर, सर्वप्रथम या देवतेच्या पुजना नंतरच करतात. या देवराईतील प्रत्येक वृक्ष हा निरीक्षण व माहीत करून घेण्यायोग्य आहे. प्रत्येक वृक्षातील एक वेगळपण आपणास जाणवतो. अनेक बांबूना एकत्र करून बांधल्यास जी मोळी तयार होते अगदी तसेच खोड असलेले वृक्ष पहावयास मिळतात.
सह्याद्रीच्या रांगेत आढळतात हेमाडपंती १२ जोतीर्लिंगे.
हातविज (जुन्नर) गाव व परिसर अतिदुर्गम आहे. हा जुन्नरपासुन साधारण 45 कि.मी अंतरावर असुन येथे नेहमीच एस.टी सेवा खुप कमी आहे. अशा या गावात वेगवेगळ्या स्वरूपाची शिवलिंगे व कोरीव दगडी शिल्पे आढळुन येतात. हि शिल्पे अस्तव्यस्त पडलेली असून येथील पौराणिक इतिहास सांगण्यास मदत करतात. यावरून असा तर्क बांधला जातो की त्र्यंबकेश्वर (नाशिक) अमृतेश्वर (रतनगड) हरिश्चंद्र गड, नागेश्वर (खिरेश्वर) माणकेश्वर (माणकेश्वर ) कुकडेश्वर (पुर) कपर्दिकेश्वर ( ओतूर) ब्रम्हनाथ (पारूंडे) डिंभे धरणातील आंबेगावाच्या ठिकाणी असलेले मंदिर, भिमाशंकर मंदिर ( भिमाशंकर ) आणि दोन मंदिरांचे अवशेष जुन्नर शहरात दिसुन येतात. यावर असे समजते की, नाशिक ते भिमाशंकर हा सह्याद्रीच्या कुशितील त्या काळी जवळचा मार्ग असावा.जो मार्ग हरिश्चंद्र गड, खिरेश्वर, आंबोली , ढाकोबा, हातविज, डोणी, आहुपेहून पुढे भिमाशंकरला जाऊन मिळतो. मध्यवर्तीत ठिकाण म्हणजेच पुरातन व्यापारी मार्ग व व्यापाराची राजधानी अर्थातच “जुन्नर” होय. म्हणूनच या ठिकाणी सहा हेमाडपंती मंदिरे दिसत असून ती जुन्नर शहराच्या पश्चिम पट्यात दिसतात. सर्वात जास्त सात किल्ले, सर्वात जास्त लेणी समुह, त्या व्यतिरिक्त जुन्नर,ओतूर, नारायणगाव, बेल्हे या ठिकाणी असलेले भुईकोट किल्ले या परीसराच्या संरक्षणाची साक्ष देतात. आणि म्हनूनच आपणास त्यावेळी येथे असलेला राबता किती मोठ्या प्रमाणात होता याची खात्री पटते.
लुप्त झालेले हेमाडशैली बांधणीतील शितळेश्वर मंदिर - सितेवाडी
अशाच एका जुन्नर तालुक्यातील हेमाडशैली बांधणितील मंदिरा बाबत माहिती घेणार आहोत कि जे काळाच्या ओघात नष्ट झाले परंतु त्याच्या पाऊलखुणा अवशेष रूपात धुळ खाताना पहायला मिळतात.
गजांतलक्ष्मी शिल्पांचे निरीक्षण केलेत तर दोन बाजूने हत्ती आपली सोंड उंच करून टोकाला त्या मिळालेल्या असुन टोकाचा भाग खाली वाकलेला दिसतो. अगदी याच ठिकाणी सरळखाली दोन हत्तींच्या मध्ये एक स्रीशिल्प कोरलेले दिसते. या स्त्रीला ते सोंडेतून पाणी टाकून अंघोळ घालताना दिसते हे शिल्प म्हणजेच लक्ष्मीमातेचे चित्र होय. म्हणून या शिल्पाला गजांतलक्ष्मी असे संबोधण्यात येते. गावा गावांत अशी अनेक विविध शिल्पे पडलेली असतात परंतु दगड म्हणून त्याकडे सर्वच दुर्लक्ष करत असतात. खरेतर गावाचा ऐतिहासिक वारसा दाखवून देण्याचे काम हि शिल्पे करत असतात म्हणून या शिल्पांना सोन्यांच्या दागिण्यापेक्षाही जास्त जपलं पाहिजे कारण तो संपूर्ण गावचा इतिहास उजेडात आणण्यासाठी महत्वपूर्ण पुरावा असतो. आज पण हजारो वर्षे उन,वारा व धुळखात पडलेली ही शिल्पे तगधरुन उभी किंवा पडलेली आहेत ती फक्त गावचा इतिहास उजेडात आणण्यासाठीच. आपण त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन ती संवर्धीत करण्यासाठी योगदान दिले पाहिजे.
जुन्नर तालुक्यातील खोडद गावात आढळले तेरावे गजांतलक्ष्मी शिल्प –
पुर्वी म्हणे की पाऊस वेळेवर पडला नाही की खोडद ग्रामस्थ या दगडी शिल्पावर दगड रचुन बोजा दिला जायचा व पाऊस पडू दे अशी आर्त हाक या दगडी रुपातील शिल्प असलेल्या या भवानी मातेला दिली जायची मग काय आश्चर्य पाऊस हमखास पडायचाच असे ग्रामस्थ छान अनुभव सांगता व नंतर त्यावर ठेवलेल्या वजना इतकी गुळाची शेरणी गावात वाटली जायची व तो भवानी मातेवर ठेवलेला बोजा उतरविला जायचा. भवानी माता म्हणून या उघड्या पडलेल्या शिल्पाला हात जोडले जायचे आज याच उघड्या पडलेल्या शिल्पाला खोडद ग्रामस्थांनी मंदिर निर्माण करत खुप सुंदर जतन केले आहे. शेजारीच दक्षिणेकडे एक अर्धवट तुटलेल्या वीरगळीचा तुकडा पण पण जतन केला असुन गावातील एका वीराचा जनू तो सन्मानच केल्यासारखे वाटते.(गजांतलक्ष्मी शिल्प, खोडद)

जुन्नर तालुक्यातील खामगाव, निरगुडे , निमगीरी (किल्ले निमगिरी वर), नाणेघाट, घाटघर, किल्ले जीवधन,घंगाळधरे, माणकेश्वर , बोरी शिरोली, भुत लेणी व पिंपळगाव तर्फे नारायणगाव आणि खोडद अशा तेरा ठिकाणी विविध गावांमध्ये म्हणजे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक दिशेला ही गजांतलक्ष्मीची शिल्पे पहावयास मिळतात.
श्री.स्वयंभू गुप्त विठोबा प्रति पंढरपूर
चार वर्षे ४×४ फुट खोलीत श्री.स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची ती जुनी मुर्ती ग्रामस्थांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. पुढे सन १९२१ साली प्रसिद्ध मुर्तिकार कै. कृष्णा भागवत यांनी ग्रामस्थ व भाविकांच्या सहकारातुन मुर्तीची प्रतिस्थापना केली.याच गुहेच्या वर एक मंदिर असावे म्हणुन १९५२ साली मंदिराचे काम सुरू केले परंतु अनेक अडी- अडचणी आल्याने हे अर्धवट काम बंद पडले. ते अर्धवट काम १९६४ साली प्रसिद्ध मुर्तिकार व शिल्पकार श्री. शामाकांत भागवत यांच्या अथक सहकार्याने पुर्ण करून त्या वरील मंदिरात देखील मुर्तीची स्थापन करण्यात आली. सध्या गुहा आणि गुहेवर असलेले नविन मंदिर या दोन्ही ठिकाणी मुर्ती आहेत. आषाढी कार्तिकी एकादशीला ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य अशी यात्रा येथे साजरी केली जाते. या यात्रेस पुणे,नगर,मुंबई, ठाणे येथील असंख्य भाविक पंढरपूरला न जाऊ शकल्याने प्रति पंढरपूर म्हणुन येथे दर्शनासाठी रांगा लावत असतात. यात्रेकरूंची जेवणाची किंवा उपवासाची गैर सोय होऊ नये म्हणून येथे या दिवशी 3 टन खिचडी अन्नदान व प्रसाद म्हणून भाविकांना दिली जाते.
आज बांगरवाडी गाव व मंदिर परिसर धार्मिक व निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ म्हणून उदयास येत आहे. गुप्त विठोबा मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे. येथील परिसराची भेट घ्यायची झालीच तर आपणाकडे दोन दिवस वेळ असायला हवा. कारण जवळपास असलेली बेल्हे गावची नवाब गढी, संत ज्ञानेश्वर वेद प्रणित रेडा समाधी, पराषर कृषी पर्यटन केंद्र राजुरी, जगातील एकोणीस पैकी असलेला आणे घाटातील नैसर्गिक पुल, आणे गावातील संत रंगदास स्वामी समाधी, तसेच नळावणे गावातील विविध ऐतिहासिक व निसर्ग संपदेच आपणास मुक्तपणे दर्शन घेण अगदीच सोपे जाते.
आज आधुनिक युगात येथे एक चांगलाच औद्योगिक विकास झालेला पहावयास मिळतो.त्यामुळे येणारा पर्यटक येथे आनंदाने सुखावलेला पहावयास मिळतो. आपणही एकदा एक ऐतिहासिक वारसा म्हणून भेट द्या.
कळमजाई मंदिर :-
निसर्गाची किमयाच न्यारी अस म्हणणे वावगे ठरणार नाही. निसर्गाशी जेवढी जवळीक साधण्याचा प्रयत्न कराल तेवढे आपणास निसर्ग दिल्या शिवाय राहत नाही. नाणेघाटाच्या रस्त्यावर फांगुळगव्हाण जवळील रस्त्याच्या पश्चिमेस असलेल हे कळमजाई मंदिर या मंदिराचा जीर्णोध्दार पुर्ण न झाल्याने ते रंगरंगोटी पासुन अपुर्ण अवस्थेत दिसुन येते. परंतु पावसाळ्यात हे मंदिर पाहिले तर आश्चर्य वाटले कारण चक्क निसर्गाने बहाल केलेली ही हिरवीगार रंगोटीने या मंदिराला एक मोठी देणगीच तर दिली की काय असे वाटले.
पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस जुन्नर तालुक्यात कल्याण नगर राज्य महामार्ग क्र.222 वर पुण्यापासून 100 कि.मी अंतरावर वसलेले ऐतिहासिक ओतूर हे गाव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध झाले,ते येथील कपर्दिकेश्वर आणि बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी स्थळामुळे. इ.स १३४७ मध्ये महाराष्ट्रात बहमनी राज्याची स्थापना झाली.त्यावेळी ओतूर गावाचा व जुन्नर परिसराचा समावेश बहमनी राज्यात होता.बहमनी राज्याच्या विघाटनानंतर निर्माण झालेल्या पाच सत्तां पैकी ओतूर परिसरावर निजामशाहीची सत्ता होती.१० नोव्हेम्बर १५६६ रोजीच्या एका फार्सी पत्रामध्ये ओतूर गावचा उल्लेख वोतूर असा आढळतो.
उत्तमापूर हे गावचे प्राचीन नाव.या नावातच ओतूर गावाची प्राचीनता लक्षात येते.उत्तमापूर चा अपभ्रंश होत ओतूर हे नाव पुढे पुढे रूढ़ झाले.फार पूर्वीपासून मांडवी नदी किनारी वसलेले समृद्ध प्राचीन नगर आणि “स्वयंभू शिवलिंगाच्या” कपर्दीकेश्वर मंदिराच्या जागृत अशा ठिकाणाचा उल्लेख पुराणकालापासून होत आलेला आहे; परंतु हे स्थान खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते शिवलिंगावरील “कलात्मक” कोरड्या तांडळाच्या पिंडीमुळे आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना त्यांचे गुरु बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज यानी स्वप्नात येऊन अनुग्रह देऊन उपदेश केल्यामुळे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तपश्चर्येसाठी उत्तम असे ठिकाण म्हणून उल्लेख केलेला आहे. संतांची तपोभूमी म्हणून या ठिकानाला खूप महत्व असूनही पंढरपूर ,आळंदी ,देहू यांच्या तुलनेत ओतूर हे तीर्थक्षेत्राचे स्थान मात्र महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिलेले आहे.
कपर्दीकेश्वर या नावाविषयी एक आख्यायिका आहे. राघव चैतन्य स्वामींचा कार्यकाल १५ व्या शतकातील आहे. त्यांनी मांडवी नदीकिनारी घनदाट अरण्यात महर्षी व्यासांचे दर्शन व्हावे म्हणून कठोर साधनेद्वारे बारा वर्षे अनुष्ठान केले. येथील मांडवी नदीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करीत असताना त्यांना एक कवडी मिळाली. (संस्कृतमध्ये कवडीला कपर्दिका असे म्हणतात.) आपल्या तपश्चर्यचे फळ म्हणजे कवडी मिळाल्यामुळे. महाराज अतिशय दुःखी झाले. त्यांनी ती कवडी फोडली. त्यात एक अतिशय तेजस्वी, सुंदर स्वयंभु शिवलिंग मिळाले. महाराजांच्या प्रेरणेने या लिंगाचे कपर्दीकेश्वर हे नामकरण करुन या ठिकाणी लोकांनी मंदिर बांधले. तसेच नवव्या शतकातील शिलाहार राजवंशातील नववा झंझ या राजाने प्राचीन शिवलिंगावर सुंदर मंदिर उभारले होते. १२ व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुध्दा या तपोभूमीचा उल्लेख केला आहे. यादव राजवटीच्या अस्तानंतर अनेक लहानमोठ्या टोळ्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. यात इराणच्या मुस्लीम टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घालून खुप संपत्ती लुटण्याबरोबर या ठिकाणची मंदिरे देखील जमीनदोस्त केली. त्या काळात याच मांडवी तीरावर घनदाट जंगलात या प्राचीन व जागृत शिवलिंगाची स्थापना महर्षी व्यासांनी राघव चैतन्य महाराजांच्या हस्ते करून मंदिर उभारणी केली. मांडवी नदी ऋषिवर्य मांडव्य ॠषींच्या आश्रमापासून उगम पावून आपल्या दोन्ही किनाऱ्यांच्या पारिसरला विलोभनीयरीत्या सुशोभीत करीन या तीर्थक्षेत्राजवळ येऊन दाक्षिणवाहिनी चंद्राकार घेऊन संथपणे आजही वाहत आहे. याच पवित्र ठिकाणी बाबाजी ऊर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शु. द्वादशी इ.स.१५७१ रोजी वयाच्या ४७व्या वर्षी ओतुर येथे संजीवन समाधी घेतली. ठिकाणी संत चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश करून अनुग्रह देत ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला. या मंत्राचा जप आज जगभर होताना आढळतो. चैतन्यांच्या संजीवन समाधीवर वाढलेले वारुळ हे नैसर्गिक असून, दगड किंवा विटांचा यात समावेश नसूनसुद्धा शेकडो वर्षे होऊनही या समाधीची एक कण माती सुद्धा वेगळी झाली नाही. १९५३ साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपर्दीकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि १९५८ साली मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. तसेच चैतन्यस्वामी समाधी स्थानावर मंदिर बंधण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचे भव्य असे मंदिर देहु व ओतुर या दोनच ठिकाणी आहे.
ऐतिहासिक महादेव मंदिर - पिंपरी पेंढार
आपण कधी पुणे ते नाशिक प्रवास करत असाल किंवा अहमदनगर ते कल्याण प्रवास करत असाल तर आळेफाटा येथे उतरून आळे येथील अगदी 4 कि.मी अंतरावर असलेल्या या रेडा समाधीचे नक्कीच दर्शन घेऊ शकता.
याच गावातून पुर्व पट्यातील आणे व इतर 10 गावांना येथुनच पाईपलाईन द्वारा पाणी पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे जुन्नर तालुक्यातील इतर चार धरणांचे पाणी या येडगाव धरणात आणले जाते. येथील परीसर पाहता आपण बाहेर देशात आहोत की काय असा भास होतो. येथील मळगंगा मंदिराच्या आवारातील वडाचे झाड जवळपास 400 वर्ष जुने असुन आजही ते सुरक्षित आहे. जो एकदा या परिसरास भेट देईल तो निश्चितच वारंवार या परीसराच्या दर्शनास गेल्या शिवाय राहणार नाही.
येथील गध्देगाळचा वापर गावकरी जर पाठीची शिर भरली असेल तर या दगडावर झोपल्यावर व्यवस्थित होते व आराम मिळतो. याच गावाला लागुन येडगाव धरणभिंत लाभली असल्याने येथील परीसर नेहमीच हिरवाईचा शालू पांघरलेला दिसतो. संपूर्ण परीसरास उसाचे अच्छादन पहावयास मिळते.
या जुन्या उंब्रज गावचा एक पर्यटन म्हणून जर विकास केला गेला तर निश्चितच येथील तरूण व तरूणींना रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होतील फक्त गरज आहे ती एक चांगल्या प्रकारच्या पर्यटन विकासीत आराखड्याची व गावकर्यांच्या सहभागाची. की ज्यांच्या माध्यमातून साकार होईल एक विकसीत पर्यटन स्थळ. या विकासासाठी मराठाबाणा फेम अशोकजी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ती भक्तभवन बांधून सुरूवात झाली आहेच.
भुयारी मार्ग एक उत्सुकता…
जुन्नर तालुक्यात असलेल्या भुयारीमार्गांची सत्यता स्वतः पडताळून पहायची मोहीम या परिसरातील रहिवासी श्री. रमेश खैरमाळे यांनी केली. पाच भुयारीमार्ग त्यांना जे प्रत्यक्ष अनुभव आले आहेत, ते खालील प्रमाणे आहेत.
1) किल्ले शिवनेरीच्या साखळदंडाच्या तोडाशी असलेल्या टाकीतील तीन भुयारी मार्ग.
सांगितले जायचे कि किल्ले रायगड, किल्ले नारायणगड व किल्ले शिवनेरीच्या गर्भा जाण्यासाठी व फिरण्यासाठी हे मार्ग आहेत. परंतु गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी 2015 ला रात्री ठिक 1:30 वाजता या टाकीत मी शिरून हे मार्ग मित्राच्या मदतीने चेक केले. परंतु येथे काहीही नसुन ते फक्त तीन ते चार फुट आडवे कोरलेले असून शत्रुंना संभ्रमात पाडण्यासाठी अतिशय चातुर्याने केलेला हा प्रयत्न आहे.
2) पंचलिंग मंदिराच्या जवळ असलेला भुयारीमार्ग.
हा भुयारीमार्ग नसुन एक भुयारी पाण्याची टाकी आहे की जिचा जमिनीत 30 ते 35 फुट आडवा बांधीव तोडीतील विस्तार असुन. पावसाळ्यात पडणार्या पाण्याचा साठा येथे केला जायचा व उत्कृष्ट पध्दतीने तो वर्षभर पंचलिंगाच्या मंदिराच्या समोरील टाकीत तो चालू राहील याची केलेली ती सुविधा आहे. तो कोणत्याही प्रकारचा भुयारी मार्ग नाही.
3) हटकेश्वरावरील भुयारीमार्ग. ( साळुंकी)
आपणास नेहमीच ऐकवले जाते की अष्टविनायक लेण्याद्री “गिरीजात्मजाचे” आपण जे रूप पहात आहोत तो भाग हा पाठीमागील भाग आहे व गणेशाचे तोंड पश्चिम दिशेला असणाऱ्या भुयारीमार्गाकडे आहे. हा भुयारीमार्ग हटकेश्वरावर असलेल्या भुयारातुन सुरू होतो कि ज्याच्या तोंडाशी एक शिवलिंग आहे. मित्रांनो या भुयारीमार्गाच्या तोंडाशी शिवलिंग आहे हे खरे आहे परंतु हा मार्ग पंधराफुट सरळ जाऊन उत्तरेकडे पंधरा फुट गेलेला असून तेथेच संपतो.
4) किल्ले जिवधनच्या जुन्नर दरवाजा मार्गाच्या मध्यावर उजव्याहाताला असलेला भुयारीमार्ग.
मी किल्ले जीवधनवर अनेक वेळा गेलो व अनेक वेळा सांगितले जायचे कि हा मार्ग संपूर्ण जीवधन मध्ये अंतर्गत फिरण्यासाठी कोरलेला आहे. परंतु तसे काहीही नसुन तो तीस फुट कोरत नेलेला असुन पुढे दहा बारा फुट आडवा कोरला असून तेथे आराम करण्यासाठी सुविधा केली आहे.
5) बोतार्डेगावच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरावरील रांजण मार्ग.
स्थानिक सांगतात की पुर्वी या मार्गाने तांबे गावला जायला आठ दिवस लागायचे. परंतु असे काहीही नसून डोंगराच्या आतून येणाऱ्या पाण्याने हा नैसर्गिक चाळीसफुट लांबीचा मार्ग तयार झाला असून यात सरपटत पुढे शेवटार्यंत जाता येते. व त्यापुढे टिपटिप पाणी येईल येवढेच छिद्र आहे. या मध्ये प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी कारण खूपच दमछाक होते. नैसर्गिक तयार झाल्याने त्यातएकरूपता नसल्याने किटक व प्राणी असू शकतात.
वरील भुयारीमार्ग आपणास अभ्यासवयाचे असतिल तर स्वतः काळजी घेणे आवश्यक आहेत. माझा मिलेट्रीचा अनुभव माझा गुरू असल्याने मी ही माहिती आपणापर्यंत पोहचवू शकलो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. व तालुक्यात अजुन अशी काही ठिकाणे असतील तर ती मला पर्सनल शेर करावीत कि त्यांची सत्यता पडताळून मला आपणापर्यंत उजेडात आणता येतील हीच सदिच्छा व्यक्त करतो.
जुन्नर तालुक्यात असलेल्या भुयारीमार्गांची सत्यता स्वतः पडताळून पहायची मोहीम या परिसरातील रहिवासी श्री. रमेश खैरमाळे यांनी केली. पाच भुयारीमार्ग त्यांना जे प्रत्यक्ष अनुभव आले आहेत, ते खालील प्रमाणे आहेत. 1) किल्ले शिवनेरीच्या साखळदंडाच्या तोडाशी असलेल्या टाकीतील तीन भुयारी मार्ग.
सांगितले जायचे कि किल्ले रायगड, किल्ले नारायणगड व किल्ले शिवनेरीच्या गर्भा जाण्यासाठी व फिरण्यासाठी हे मार्ग आहेत. परंतु गेल्या वर्षी 19 फेब्रुवारी 2015 ला रात्री ठिक 1:30 वाजता या टाकीत मी शिरून हे मार्ग मित्राच्या मदतीने चेक केले. परंतु येथे काहीही नसुन ते फक्त तीन ते चार फुट आडवे कोरलेले असून शत्रुंना संभ्रमात पाडण्यासाठी अतिशय चातुर्याने केलेला हा प्रयत्न आहे.
2) पंचलिंग मंदिराच्या जवळ असलेला भुयारीमार्ग.
हा भुयारीमार्ग नसुन एक भुयारी पाण्याची टाकी आहे की जिचा जमिनीत 30 ते 35 फुट आडवा बांधीव तोडीतील विस्तार असुन. पावसाळ्यात पडणार्या पाण्याचा साठा येथे केला जायचा व उत्कृष्ट पध्दतीने तो वर्षभर पंचलिंगाच्या मंदिराच्या समोरील टाकीत तो चालू राहील याची केलेली ती सुविधा आहे. तो कोणत्याही प्रकारचा भुयारी मार्ग नाही.
3) हटकेश्वरावरील भुयारीमार्ग. ( साळुंकी)
आपणास नेहमीच ऐकवले जाते की अष्टविनायक लेण्याद्री “गिरीजात्मजाचे” आपण जे रूप पहात आहोत तो भाग हा पाठीमागील भाग आहे व गणेशाचे तोंड पश्चिम दिशेला असणाऱ्या भुयारीमार्गाकडे आहे. हा भुयारीमार्ग हटकेश्वरावर असलेल्या भुयारातुन सुरू होतो कि ज्याच्या तोंडाशी एक शिवलिंग आहे. मित्रांनो या भुयारीमार्गाच्या तोंडाशी शिवलिंग आहे हे खरे आहे परंतु हा मार्ग पंधराफुट सरळ जाऊन उत्तरेकडे पंधरा फुट गेलेला असून तेथेच संपतो.
4) किल्ले जिवधनच्या जुन्नर दरवाजा मार्गाच्या मध्यावर उजव्याहाताला असलेला भुयारीमार्ग.
मी किल्ले जीवधनवर अनेक वेळा गेलो व अनेक वेळा सांगितले जायचे कि हा मार्ग संपूर्ण जीवधन मध्ये अंतर्गत फिरण्यासाठी कोरलेला आहे. परंतु तसे काहीही नसुन तो तीस फुट कोरत नेलेला असुन पुढे दहा बारा फुट आडवा कोरला असून तेथे आराम करण्यासाठी सुविधा केली आहे.
5) बोतार्डेगावच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरावरील रांजण मार्ग.
स्थानिक सांगतात की पुर्वी या मार्गाने तांबे गावला जायला आठ दिवस लागायचे. परंतु असे काहीही नसून डोंगराच्या आतून येणाऱ्या पाण्याने हा नैसर्गिक चाळीसफुट लांबीचा मार्ग तयार झाला असून यात सरपटत पुढे शेवटार्यंत जाता येते. व त्यापुढे टिपटिप पाणी येईल येवढेच छिद्र आहे. या मध्ये प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी कारण खूपच दमछाक होते. नैसर्गिक तयार झाल्याने त्यातएकरूपता नसल्याने किटक व प्राणी असू शकतात.
वरील भुयारीमार्ग आपणास अभ्यासवयाचे असतिल तर स्वतः काळजी घेणे आवश्यक आहेत. माझा मिलेट्रीचा अनुभव माझा गुरू असल्याने मी ही माहिती आपणापर्यंत पोहचवू शकलो याचा मला सार्थ अभिमान वाटतो. व तालुक्यात अजुन अशी काही ठिकाणे असतील तर ती मला पर्सनल शेर करावीत कि त्यांची सत्यता पडताळून मला आपणापर्यंत उजेडात आणता येतील हीच सदिच्छा व्यक्त करतो.
बोतार्डे डोंगरातील नैसर्गिक भुयार.
जुन्नर तालुक्याला भौगोलिक वारसा पण प्रचंड लाभलेला पहावयास मिळतो. बोरी गावची टेप्रा राख तर जुन्नर तालुक्याचा लाखो वर्षांपूर्वीचा अश्मयुगीन वारसा प्रकाशझोतात आणते तर गुळुंचवाडीचा, आलमे व खिरेश्वरचा नैसर्गिक पुल अनेक वर्षांचा नैसर्गिक बदलाचा अभ्यास करण्यासाठी भाग पाडते आणि विशेष म्हणजे ऐतिहासिक नाणेघाट घळ व हटकेश्वरच्या घळीमध्ये आपणास स्टॅंडीग डाईकचे उभे खाप निर्मितीचे रुप पहायला मिळते. यांतील एक नैसर्गिक चमत्कार पहावयास मिळतो तो जुन्नर तालुक्यातील बोतार्डे गावच्या डोंगर रांगेत असलेले नैसर्गिक भुयार. खरेतर या नैसर्गिक मोठ्या गुहेचा वापर मनुष्य राहण्यासाठी करत. व छोटाशा नैसर्गिक भुयारांना पण विशेष आकार देत पण कोरली जात असे. बोतार्डे गावचे हे नैसर्गिक भुयार आडवळणी असल्याने आहे त्याच नैसर्गिक स्थितीत आहे तसेच पहायला मिळते. कधी काळी जंगली श्वापदांचे राहते घर म्हणजे हीच भुयार, कपारी व नैसर्गिक गुहा असतं. कालांतराने माणसांचा संचार जंगलांमध्ये वाढु लागला व जंगलांना वनवे लावून या श्वापदांना मानवाने असुरक्षित केले की ज्याची फळे आपणास येथून पुढे भोगावी लागणार एवढं मात्र नक्की. बोतार्डे गावचे स्थानिक सांगतात की बोतार्डे गावच्या दक्षिणेस असलेल्या डोंगरावरील रांजण मार्गाने लोक तांबे गावला जायचे व हा प्रवास आठ दिवसांचा असे. मी तर हे ऐकून कोड्यातच पडलो. सोबत कृष्णा आणि अमोल मरभळ हे होते. त्यांना याबाबत विचारणा केली तर तर ते पण आमचे आजोबा पणजोबा हेच सांगत असे बोलले. मनात प्रश्न पडला की खरंच असं असु शकते का? परंतु तो मार्ग पाहील्यावरच सत्य समोर येणार होते. ते अनेक वेळा तेथे गेले असल्याने तेथे पोहचने सहज शक्य होणार होतं. मग काय मी निघालो त्यांच्या सोबत सत्य शोधायला. डोंगर चढाईला सुरुवात केली होती. वाळलेले गवत व उन्हाचा तडाखा यामुळे श्वासाची मात्र कोंडी करत होता. कृष्णाला चालता चालता विचारले आत काय आहे तर त्याने सांगितले रांजण आहे. आतातर उत्सुकता पार शिगेला पोहोचली. ऐतिहासिक नाणेघाटचा रांजण आठवला. येथे पण जकातिचा रांजण आहे की काय? असा प्रश्न पडला. श्वास फुलला होता. अंगातून घामाच्या धारांचा संचार वाढु लागला होता. कपाळावरून ओघळणारा घात हातातील रूमाल ओला करत होता. तेवढ्यात अमोल बोलला हे पहा हाच तो रांजण मार्ग. जो मनात विचार चालला होता तो क्षणात ते भुयार पाहुन बदली झाला. रांजण कुठं आहे विचारले तर तो आतमध्ये आहे सांगितले. मग काय रांजण पहायचा म्हटले तर आतमध्ये जाणं गरजेचं होतं. नैसर्गिक भुयार असल्याने आत काही नसल्याची खात्री केली व बॅटरी घेऊन आत प्रवेश केला. जाण्याचा मार्ग अरूंद असल्याने त्रासदायक होता. खाली झोपून पुढे सरपटत जावे लागत होते. शेवटी जवळपास ४०/४५ फुट पुढे गेल्यावर हा मार्ग बंद असल्याचे निदर्शनास आले व पुढे अतिशय निमुळता होत गेलेला होता. आवाज देऊन अमोलला विचारले रांजण कुठं आहे? त्याने सांगितले की तेथे जे पाणी टिप टिप ज्या खड्यात पडते आहे तोच रांजण आहे. मी तोंडांत मारून घेतली व माघारी फिरलो. कारण ते भुयार म्हणजे नैसर्गिक जलस्त्रोत होता व पावसाळ्यात त्यातून सतत पाणी वाहून ते निर्माण झाले होते. मला खात्री पटली की हा नक्कीच हा कुठलाही मार्ग नाही फक्त ही भाकडकथा रचली गेली आहे बाकी काही नाही. या मध्ये प्रवेश करताना विशेष काळजी घ्यावी कारण खूपच दमछाक होते.हे भुयार नैसर्गिक तयार झाल्याने त्यातएकरूपता नसल्याने किटक व प्राणी असू शकतात त्यामुळे यांचा अभ्यास करायचा झाल्यास अतिशय सुरक्षित व सुरक्षा घेऊनच करावा व जीव धोक्यात घालू नये.
सोनतीर्थ अर्थात कुकडी नदी उगमस्थान :-
जुन्नर -आपटाळे – चावंड – कुकडेश्वर असा येथे जवळपास 17 कि.मी प्रवास करून पोहचता येते. हे मंदिराला जाण्यासाठी चारचाकी प्रवास करणे सहज शक्य आहे. हा परीसर चहूबाजूंनी डोंगरांनी वेढलेला असल्याने येथील सुंदरतेचे वर्णन कोणत्या शब्दात व्यक्त करावे हेच कळत नाही.
याच मंदिराच्या पश्चिमेस एक दक्षिणोत्तर पसरलेली एक डोंगर रांग निदर्शनास पडते. याच डोंगराच्या मध्यभागी आपणास कुकडी नदीचे उगमस्थान असून येथे पोहचण्यासाठी पुर – शिरोलीमध्ये गाडी पार्क करून चढण्याचा सोपा मार्ग मिळतो. पाण्याच्या बाटल्या सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे कारण खुप दमछाक करणारी येथील जंगलवाट आहे. साधारण तासा भरात आपण येथे पोहचतो. जाताना निसर्गाच्या विविधतेचे दर्शन घडतेच. सध्या करवंदाच्या जाळ्या भरगोस फळांनी लगडलेल्या असून करवंदाच्या फुलांचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळलेला असल्याने आपणास चालताना तो गंध जाणवतो. विविध वृक्ष व वेलींणी हा परीसर व्याप्त असल्याने विविध पक्षी व प्राणी यांचा हा स्वर्गच आहे की काय असा भास होतो.
कातळकड्यात उंचीवर कोरलेली येथे लेणी असून यामध्ये बसण्यासाठी ओटे कोरलेले आहेत.दोन लहान मोठे शिवलिंग असून पश्चिम भिंतीवर कातळातच एक मुर्ती कोरलेली आहे. साधारण पाच बाय अडीच फुट लांबी व रूंदिची एक टाकी कोरलेली असून तीची खोली साधारण पाच फुट असावी. याच टाकीच्या पश्चिम व दक्षिण किना-यात डोंगरातुन पाण्याची सतत वाहत असलेली नैसर्गिक धार टाकीत पडते व ती पुढे खाली दरीत जाते. याच ठिकाणास सोनतीर्थ संबोधतात. ही सतत वाहणाऱ्या पाण्याची धार वर्षभर वाहत असल्याने कुकडी नदीचे उगमस्थान दर्शवित आहे. येथील दर्शन घेतल्यानंतर निसर्ग लावण्याचा अनुभव घेण्यासाठी आपणास खाली न उतरता आलेली वाट डोंगर माथ्यावर घेऊन जाते. आपल्याला थकवा जाणवत नसेल तर निश्चितच डोंगर माथ्यावरून ढाकोबा, किल्ले जिवधन, किल्ले चावंड, व-हाडी डोंगररांग, शंभू डोंगर, कुकडेश्वर मंदिर परीसर, माणिकडोह धरण, उच्छिलचा तलाव अशी अनेक निसर्गाने नटलेली दृश्य पहावयास मिळतात. परंतु यासाठी वेळ मात्र जास्त लागतो.
जुन्नर तालुक्यातील बोरीची १४ लाख वर्षांपूर्वीची टेफ्रा राख. (अश्मयुगीन जुन्नर तालुका)
2013 पासून जुन्नर तालुक्यातील पश्चिम पट्यात भटकंती करण्याचा अनेक वेळा योग जुळून आला. त्यात हरिश्चंद्र गड ते भिमाशंकर दरम्यान पसरलेल्या अथांग सह्याद्री दर्शनाने तर मला कधी प्रेमात पाडले समजलेच नाही. एकदा का भटक्यांना या सह्याद्रीत फिरण्याची चटक लागली की बस त्याला दुसरे काहीच दिसत नाही. टोलार खिंड, जुन्नर दरवाजा, इतिहास कालिन माळशेज घाट श्री छत्रपती शिवाजी महाराज #पावणखिंड, #भोरदार्या#भोरांड्याची_नाळ, #नाणेघाट, #दार्याघाट, #खुटादरा, #डोणीदरा अशा विविध कोकणकड्याच्या पायवाटा तुडवत कोकणदर्शन घेणे म्हणजे प्रत्यक्ष सह्याद्रीने घातलेल्या सादेस प्रतिसाद देताना होणारा आनंद गगणात मावेनासा होतो. प्रत्येक वाटेची एक वेगळीच कथा, विशेषता व सुंदरता. त्याच पैकी असलेला हा खुटादरा.
खुटादरा हे नाव ऐकण्यात तसे विचित्रच वाटते नाही का? परंतु जेव्हा आपण या वाटेने प्रवास करतो तेव्हा समजते की हे नाव दिले गेले ते काही चुकीचे नव्हते. या वाटेचा उतार एका नाळीतुन नसुन अतिशय थरारक उतरणीतुन करावा लागतो. व उतरताना मागे वळून पाहिले की आपण ते दृष्य पाहून थक्क होतो. अगदीच नव्वद डिग्री उंचावरून आपण खाली उतरतानाचे ते दृष्य दृष्टीस पडते व ते दृष्य एका खुंट्यासारखेच दिसते.
स्थानिक येथील कथा अतिशय थरारक सांगतात व ऐकणारा या ठिकाणी यावे की नाही असा विचार करतो. कारण हा संपूर्ण परिसर पाहीला तर तो निर्मनुष्य आहे, त्यामुळे मुंबई मधील कुख्यात गुन्हेगार पुर्वी याच भागात आपला तळ ठोकून असत.कारण येथे अथांग पसरलेल्या जंगलातून हीच एक “खुटादरा” वाट जुन्नर तालुक्यातील दुर्गादेवी व ढाकोबा परिसराला ठाणे जिल्ह्यातून जोडते. परंतु आज हे चित्र मात्र संपूर्ण बदललेल दिसते.
याच वाटेने उतरताना आपणास ठाणे जिल्ह्यातील आदिवासी रामपूर हे गाव लागते. व येथुन पुढे आपणास जीभ ने प्रवास करून धसई व सरळगाव असा प्रवास करता येतो. परंतु ही वाट उतरताना विशेष काळजी घेणे खुपच गरजेचे आहे. कारण आपली छोटीशी झालेली चुक मृत्यूच्या दारीत घेऊन जाऊ शकते.
शक्यतो या वाटेचा उपयोग करताना सोबत स्थानिक गाईड घेऊन जाणे गरजेचे आहे. कारण जंगलात पुढे अनेक आडवळणी वाटांना आपणास तोंड देत रामपुरला पोहचावे लागते. शक्यतो ही वाट स्थानिक कुणाला सांगत नाहीत परंतु आपण एक नियमित ट्रेकर असाल व आपणास एक लांब ट्रेक करायचा असेल तर खालील GPS रिडिंग च्या अधारे वाटेची सुरूवात भेटू शकते.
N19 13 31.2 E73 38 53.7
N19 13 30.2 E73 38 51.4
वरील वाटेची सुरूवात ही दुर्गादेवी मंदिराच्या उत्तरेकडे कोकणकड्याने साधारण एक कि.मी अंतरावर चालत गेलात की मिळते. परंतु एक लक्षात असू द्या की आपणास मध्यंतरी पिण्याच्या पाण्याची व जेवणाची कोठेही सोय होत नाही त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी स्वतः घेऊनच जावे. शक्य असल्यास गाईड म्हणून गुराखी हेमा पारधी (दुर्गवाडी) यांची आपणास मदत होऊ शकते.
म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी | Mhanswandi and khamundi ghat | Junnar
भटक्यांसाठी म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी...!
आज प्रथमतःच जुन्नर तालुक्यातील दोन घाटवाटांची माहीती आपणास देण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घाटवाटा दोन जिल्हयातील दोन तालुक्यांना अलिंगण देणा-या आहेत. या सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या रांगा महाराष्ट्राच्या सौंदर्य वैभवात तर भर घालतातच परंतु यांचे जाळे ज्या ज्या ठिकाणी पसरलेले आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलत आहे.
सिंगापूर सारख्या देशाचा विचार केला तर स्वतःचे पिण्याचे पाणी नसुन सुद्धा हा देश पर्यटनक्षेत्रात जगात बाप बनला आहे. का? याचे उत्तर शोधले तर निश्चितच तेथील मॅनेजमेंटला शाब्बासकी द्यावी वाटते. महाराष्ट्रात अशा मॅनेजमेंटची खरोखर गरज आहे. आपले पर्यटक होणाऱ्या -हासाच्या बाजुने विचार करत नाहीत त्यामुळे पर्यटन स्थळांचा मोठ्या प्रमाणावर -हास होत आहे. याला जबाबदार आपणच स्थानिक ग्रामस्थ म्हणावे लागेल. यावर त्वरीत उपाय अंमलात आणणे ही नैतिक जबाबदारी ही तेथील गावकरी व स्थानिकांचीच आहे. मग त्यासाठी उपाययोजना या तेथील गावक-यांनी पुढे येऊन राबविल्या तर निश्चितच पर्यटन वाढीतुन गाव विकासाला एक जबाबदार पर्यटन म्हणुन चालना मिळेल व गावचा विकास पण झपाटय़ाने होइल . हीच संधी जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार, खामुंडी तसेच संगमनेर व अकोले तालुक्यातील म्हसवंडी आणि बदगी या गावांना नैसर्गिक रित्या चालून आलेली आहे. कारण या तालुक्यांना जोडणा-या घाटवाटा म्हणजे मुक्त हस्ते निसर्ग देवतेने उधळण केलेल्या सौंदर्याची साक्ष आहेत.आणि मग सहज कवितेच्या दोन ओळी ओठांवर येतात. "हिरवे हिरवे गार गालिचे,हरित तृणांच्या मखमालीचे" येथे आपणास जिकडे नजर मारालं तीकडे सह्याद्री पर्वतरांगा, त्यावरून फेसाळनारे धबधबे , धुक्यातून डोकी काढनारे सह्याद्रिची सुळके दिसु लागतात.
येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत
मार्ग १ -
पुणे नाशीक हायवे वर बोटा हे गाव आहे .
बोटा येथुन पश्चिमेस म्हसवंडी हे गाव आहे तर जाचकवाडी मार्गे बेलापूर बदगीला पोचता येते.
(आळेफाटा - बोटा - आंबीफाटा - म्हसवंडी )
(आळेफाटा - बोटा - आंबीफाटा - जाचकवाडी )
मार्ग -२
नगर कल्याण हायवे वर पिंपरी पेंढार गाव आहे .
पिंपरी पेंढार येथुन पश्चिमेस हायवेवर उजव्या बाजूला म्हसवंडी साठी जाणारा रस्ता आहे. व येथुनच पुढे साधारण ४ किलोमीटर अंतरावर म्हसवंडी घाटाची सुरूवात होते. घाटवाट कच्ची असल्याने साधारणतः दुचाकीचा वापर योग्य आहे.
पिंपरी पेंढारपासून पुढे कल्याणकडे जाताना उजव्या हाताला बदगी कडे जाणारी एक पक्की सडक आहे या वाटेने उत्तरेकडे जवळपास 2 कि.मी अंतरावर खामुंडी घाटाची सुरूवात होते व घाटवाट चढुन बदगीस पोहचता येते.
( आळेफाटा - पिंपरी पेंढार - म्हसवंडी )
( आळेफाटा - पिंपरी पेंढार - बदगी फाटा -बदगी )
आपण म्हसवंडी घाट मार्गाने जर प्रवास करणार असाल तर प्रथम म्हसवंडी घाटाचे मनमोहक दृश्य अनुभवत पुढे आपण उजव्या बाजूला पुर्वेस म्हसवंडी गावाकडे निघावे जवळच उत्तर दक्षिण दुर्गूडी डोंगर रांग निदर्शनास पडते. याच डोंगराच्या पायथ्याशी पश्चिमेस 200 वर्षे पुराने मळादेवीचे पौराणिक मंदिर व सुंदर परीसर पहावयास मिळतो.गाडी पार्क करून येथे दर्शन झाल्यावर हळु हळु या पुर्वेस डोंगर रांगेवर चढण्यासाठी सुरूवात करावी. सोबत एक पाण्याची बाटली असावी.
घाट दर्शन झाले होते, मी व विनायकने मळादेवीचे दर्शन घेत याच प्रवासाला सुरुवात केली होती. तसा हा डोंगर सोप्या चढाई श्रेणीतील असल्याने विशेष काळजी घेण्यासारखे काहीच नव्हते. सोबतीला वाटाड्या म्हणुन बेलापुरची 4/5 वीची शाळकरी मुले शनिवारची सुट्टी झाल्याने सोबती झाली होती. जाम खुष होती ही चिमुरडी. शहरापासून लांब असलेल्या या मुलांना आम्ही काही वेगळे भासत होतो असे वाटत होते. प्रथम बुजणारे हे आमचे वाटाडे आता 200 मी चढाई केल्यावर मिसळू लागले होते. आई बापा विषयी त्यांचा आदर पाहून तर खुपच समाधान वाटले. कविता गाणी म्हणता का म्हटले तर हो म्हटले. आई बापाची गाऊन म्हटलेली कवीता तर ह्रदयाला छेद करणारी होती. रोम रोम उभे करणारे प्रसंग त्या चिमुरड्या बहादराने कवीतेच्या कडव्यात उभे केले होते. तो गात होता व मी घालवलेल्या भुतकाळात अचानकपणे फेकला गेलो होतो. गरीबिच्या झळांच्या छटा डोळ्यांपुढे त्याने सहज गाताना उभ्या केल्या होत्या. डोळ्यांच्या खाचेत दवबिंदू तरळु लागले होते. दुर्गुडीची ती डोंगररांग त्याच्या ओठातून पडणारा प्रत्येक शब्द आपल्या ह्रदयात साठवत होती. मळादेवी व मंदिरपरीसर दुरून शोभिवंत दिसत होता. पानलोट विकासाच्या कामांचा उत्कृष्ट उपयोग येथील ग्रामस्थांनी केलेला दिसत होता. वरूण राज्याच्या कृपेने त्यामध्ये जागोजागी साचलेले पाणी गाव विकासाला शेतीच्या माध्यमातून हातभार लावताना दिसत होते. शेवटी आम्ही दुर्गुडीच्या नैसर्गिक गुहेपाशी उत्तरेकडून पोहचलो.
सुमारे १२ फुट उंच आणि 30 फुट रूंद व 35 फुट लांब डोंगराच्या पोटात शिरलेली ही नैसर्गिक अशी ही गुहा आहे की जीचा आकार पुढे कमी कमी होत जातो आणि शेवटी एकदम अरुंद होतो जेथे कुणालाही जाता येत नाही. या गुहेत मी व विनायक चित्रिकरणासाठी आत शिरलो होतो. ते आपणास निश्चितपणे Nisargramya Junnar Taluka" या युट्यूब चायनलवर लवकरच पाहता येईल. येथील स्थानिक ग्रामस्थ असं सांगतात की गुहा किती खोल आहे याचा कुणाला अंदाज घेता येत नाही. तसी ही नैसर्गिक गुहा वाहत्या पाण्याने कच्या खडकावर वातावरणाच्या परीणामातून निर्माण झाल्याचे निदर्शनास येते. गुहेची दर्शनी बाजु भव्यदिव्य आहे .या जागेत जवळपास ३०-४० लोकं आरामात बसु शकतात . पुर्वी लपण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून लोक ह्या गुहेचा वापर करत .
स्थानिक ग्रामस्थ अतिशय गमतीदार आख्यायिका सांगतात की शिवाजी महाराजांच्या राज्यात अहमदनगर वरुन जुन्नर ला जाताना या मार्गाचा वापर केला जायचा आणि रात्रीचा मुक्काम या गुहेत केला जायचा .
चहु बाजूंनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा ... त्यावरुन धुक्याची चादर ओढलेल्या डोंगररांगा व वरुन फेसाळनारे पांढरे शुभ्र वाहणारे धबधबे, सतत कोसळणारा संततधार पाऊस यामुळे या परिसरास सुंदरतेचे चार चांद लागले आहे. याच डोंगराच्या पुर्वेस जोडूनच एक शिखर दिसते त्याची रचना फक्त आणि फक्त मोकळ्या दगडांत पहावयास मिळते. या डोंगराच्या शिखरावरून म्हसवंडी गावचे अलौकिक सौंदर्य न्याहाळता येते. विशेष म्हणजे या शिखरावरून जुन्नर तालुका परीसर दृश्य पाहून मन अगदी थक्क होऊन जाते.मी तर म्हणेन की येडगाव धरणाचे संपूर्ण दृश्य जर पहायचे असेल तर या पेक्षा सुंदर ठिकाण दुसरे नाहीच.
आम्ही सर्व दृश्य डोळ्यांत साठवत उतरणीला लागलो. खाली उतरल्यावर चिमुरड्यांचा निरोप घेत दुचाकीवरून म्हसवंडी गावाकडे निघालो. गावात पोहचलो तेव्हा समजले, मौज मज्जा या व्यतीरिक्त जर काही शिकायचे असेल तर म्हसवंडी गावात
पाणलोट प्रकल्प प्रशिक्षण , महीला सबलीकरण प्रशिक्षण केंद्र आहे .या केंद्रास आजपर्यंत देशातल्या सर्व राज्यांच्या टीम येउन गेल्या आहेत , तसेच परदेशातल्या विवीध देशाच्या ७० टीम येथे भेट देउन गेल्या आहेत. या केंद्राला भेट द्यायची असेल तर आधी तसं कळवावे लागते.
गावातील लाकडी दुमजली मारूती मंदिर पौराणिकता व जुनेपण टिकून आहे. मोरांच्या वास्तव्याची जान येथे येणाऱ्या त्यांच्या आवाजातुन येते. शासकीय आश्रमशाळा तर येथील खास आकर्षण वाटते. येथुन पुढे आम्ही निघालो होतो ते बेलापूर पहावयास. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे गाव होत. जाचकवाडी व तेथील वेताळेश्वराचे दर्शन घेत व परीसर अनुभव घेत आम्ही बेलापूर मध्ये पोहचलो. वेशीतुन आत आल्यावर विविध जुन्या वाड्यांचे दर्शन घडले. भैरवनाथाच्या मंदिराबाहेर अगदी माईलस्टोनरूपात गाडलेल्या एका विरघळीने आमचे विशेष लक्ष वेधून घेतले व सर्व उलगडा बेलापूरचा झाला तो इथेच. भैरवाचे जुने मंदिर व शेजारी असलेले लुप्त हेमाडपंती महादेव मंदिर व अवशेष तसेच पुष्करणीच्या भिंतीत गाडलेल्या पाऊलखुणा व मुर्त्या. खरच हे गाव इतिहासाकारांना निरिक्षण व अभ्यास म्हणून पर्वणीच आहे. येथील सर्वात मोठा व चर्चेचा विषय ठरले ते येथील पौराणिक योगी रामदासबाबा संजीवन समाधी मंदिर, याच मंदिरा समोर लक्ष वेधून घेतो तो खापरी कौलारू स्वरूपाचा सरंजाम. येथे अनेक ग्रामस्थ घडल्याचे स्थानिक सांगतात. येथील वाड्यांचा विशेष अभ्यास करता येईल. सर्व काही पाहून व गाडे मावशींनी बनवलेल्या चहाचा स्वाद घेत आम्ही बदगीकडे जाण्यासाठी निघालो.
निसर्गाची किमया पाहत पाहत आम्ही बदगीला पोहचलो. गावातील राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाने आमचे विशेष लक्ष वेधून घेतले. मग काय दुचाकी उभी करत नकळतच हात झुकले ते त्यांना मुजरा करण्यासाठी. बदगीतील बारव पाहण्यासारखी आहे. चौकोणी आकाराच्या या बारवेला उत्तम थारोळ्याची रचना केली आहे ती उत्तर दिशेने. चारही बाजूंनी पाणी शेंदण्यासाठी उत्तम रहाटाची सुविधा केली असून पुर्वेकडून पाणीपुरवठा करण्यासाठी टाकीची सुविधा केली आहे. परंतु ही बारव तलावात पोहत असल्याने जास्त काही निरीक्षण करता आले नाही. परंतु हा याच तलावात वाळलेल्या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर पिंपळवृक्षाने हात बाहेर काढून आंब्याचा सहारा घेत आपल्या आयुष्याला केलेली सुंदर सुरूवात पाहून आश्चर्य वाटते. कारण पिंपळवृक्षाच्या मुळ्या जमीनीस स्पर्श करताना दिसत नाहीत व झाड वाळलेले आहे मग ते जिवंत कसे? हे एक आश्चर्य वाटले.
परतीचा प्रवास सुरू झाला होता. घाट माथ्यावर पोहचलो होतो. घाटमाथ्यावरील शंकराच्या हातातील त्रिशुळाच्या रचनेतील रस्ता पाहून या वाटेचे वेगळेच दर्शन घडले. या घाटाने प्रवास करताना माळशेज घाटवाटेने आपण प्रवास करतो की काय असा भास होतो. पुर्वेकडील डोंगररांगेवर फेसाळनारे धबधबे पहावयास मिळतात. मित्रांनो एक विनंती असेल की मला जुन्नर जुन्नर तालुक्यातील सर्वात ठिसुळ खडक असलेली घाट वाट आढळून आली ती हीच खामुंडी घाट वाट. त्यामुळे भर पावसाळ्यात या वाटेवर निश्चितच थांबू नका नये. जुन्नर व ओतुर परिसराच्या सुंदर दृश्याचा अनुभव येथे होतो.
पोटात कावळे ओरडून सांगू लागले होते. तुमच फिरणे झाले असेल तर आमच्याही थोडा विचार करा. म्हणून दुचाकीचा वेग वाढवला होता तो जुन्नर च्या दिशेने त्या पोटातील ओरडणा-या कावळ्यांची भुक शांत करण्यासाठी. जाता जाता एकच सांगेल की एकदिवसीय उत्तम ट्रेक जर निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा असेल व तोपण दुचाकीवरून तो हाच दोन घाटमार्ग ट्रेक.
विमान अपघात, निमगिरी डोंगर (दौनड्या डोंगर) जुन्नर ( ५१ वर्ष )
सह्याद्रीच्या उपपर्वत रांगे मध्ये दौनड्या डोंगर (निमगिरी डोंगर) माळशेज घाटाला लागून आहे. या डोंगराच्या एका बाजूला "तळमाची" गाव तर दुसऱ्या बाजूला "देवळे" गाव आहे.
हा डोंगर आजवर अनेक घटनेचा साक्षीदार राहिला आहे. यात काही चांगल्या तर काही वाईट घटनांचा समावेश आहे. अशीच एक वाईट घटना ५१ वर्षा पूर्वी या डोंगरावर घडली होती.
५१ वर्षा पूर्वी निमगिरी तळमाची येथील दौनड्या डोंगरावर जुलै ०७, १९६२ रोजी रात्री ११:५९ वाजता Alitalia Flight 771 (McDonnell Douglas DC-8-43) हे सिडनीचे विमान कोसळले होते. या विमानात ९४ प्रवाशी होते, ते Bangkok - Bombay या मार्गावरील होते. Navigation error आणि अजून इतर कारणांमुळे या विमानाचा अपघता झाला. या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की या अपघाता मधून एकही प्रवाशी वाचू शकला नाही. विमाना स्पोट होऊन उसळलेल्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. रात्रीची वेळ असल्या मुळे नक्की काय झाले आहे याचा स्थानिक लोकांला अंदाज न आल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते.
दौनड्या डोंगराचा ऊंच पण, सगळीकडे असलेले घनदाट जंगल आणि जाण्यास असलेला अवघड मार्ग या मुळे मदत कार्य मिळण्यास खूप अडथला आला.
आज त्या घटनेला ५१ वर्ष पूर्ण झाले आहे, परंतु तेथील नागरिकांच्या मनात त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. तेथील स्थानिक वयस्कर नागरिक या घटनेची माहिती सांगताना जुन्या आठवणीत रमतात. स्थानिक वयस्कर नागरिकांच्या तोंडून या घटने बद्दल ऐकताना अंगावर काटा येतो.
अपघाता नंतर सर्व काही जळून गेले होते, तिथे पडलेला एक Gas सिलेंडर आणि विमानाचा पत्रा आजही तळमाची गावा मधील जि.प. शाळे मध्ये जपून ठेवला आहे.
स्थानिक आदिवासी लोकांनी या घटनेवर बोली भाषेत गाणी तयार केली होती, ती गाणी आजही स्थानिक लग्न समारंभात ऐकायला मिळतात.
आजही त्या आठवणी तश्याच आहेत, अंगावर काटा आणणाऱ्या, डोळ्यात पाणी आणणाऱ्या....
खोडदगावचे एक अभ्यासु,प्रेमळ , मनमिळावू व जुन्नर तालुक्याचा चालता बोलता पक्षिकोष म्हणजे सुभाष कुचिक, इतिहास अभ्यासक गुरुवर्य विनायक खोत सर( जुन्नरी कट्टा संस्थापक)आणि विजयजी कोल्हे (स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था जुन्नर - अध्यक्ष) आणि आदि मंडळी आम्ही चार पाच वर्षांपूर्वी जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेल्या कोपरे गाव मार्गे फोफसंडीतील कोंबडकिल्याचा अभ्यास दौरा करण्यासाठी निघालो होतो. कोपरे गाव व फोफसंडी परीसराचे निरिक्षण करत असताना सुभाष तेथील डोंगर रांग व क्रांतिकारक कोंडाजी नवले यांच्याविषयी माहिती देत चालला होता. कोंडाजी नवलेंची जुन्नर ते फोफसंडी वाटचाल कशी असायची याबाब सुभाषने रांजणा डोंगरा विषयी बोलताना माझ्या हृदयाच्या कोठारात संच होईल अशी एक माहीती मला दिली होती. तो सांगत होता मेजर रांजणा हा डोंगर आहे की किल्ला हे एकदा आपण भटकंती दरम्यान निरीक्षण करून पाहुया. उद्देश हाच होता की जर तो किल्ला असेल तर जुन्नर तालुक्यातील सात किल्यांच्या जोडीत हा आठवा किल्ला म्हणून उदयास येईल. हा किल्ला असण्याबाबतच्या शंका त्याने त्यावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची उदाहरणे देत मला पटवून दिल्या होत्या. जवळपास चार पाच वर्षं डोक्यात घोळत पडलेलं हे प्रकरण वाचायला व अनुभवयाला जायला दोघांचा काही केल्या योगच जुळुन येत नव्हता. कदाचित ही भटकंती सुभाष बरोबर माझ्या नशिबी नव्हतीच असे वाटले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नाईलाजास्तव शेवटी येथे जाण्याचा मी बेत पक्काच केला. घोळत पडलेलं हे प्रकरण प्रत्यक्ष कृतीतून वाचुनच काढायचं ठरवलं होतं. सोबत कुणी तरी हवं म्हणून आपत्ती व्यवस्थापन जुन्नर टीम चे अध्यक्ष प्रशांत कबाडी व सदस्य राजकुमार यांना सोबत घेऊन जायचं ठरलं व तसा जाण्याचा दिवस पक्का झाला.
ज्या दिवसाची मी वाट पहात होतो तो दिवस उजाडला होता. प्रशांत भाऊ व मी सांगणोरे गावाकड दुचाकीवरून जायला निघालो होतो. राजकुमार मागुन येणार होता म्हणून आमच्या दुचाकीचा वेग कमी होता. ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा होणार प्रचंड होणारा त्रास आज मात्र एवढा होणार नव्हता. आमच्या गप्पा सुरू झाल्या होत्या कारण राजकुमार येईपर्यंत पुढे जाणं पण शक्य नव्हते. अगदी थोड्याच वेळात गोळेगाव पुलावर येऊन राजकुमार आम्हाला मिळाला व आम्ही बनकरफाटा मार्गे पिंपळगाव जोगा गावाहुन पुढे सांगणोरे गाव गाठले. येथे आम्हाला सुरेश भालचिम भेटणार होता व तोच पुढे आमचा वाटाड्या म्हणून लिड करणार होता. येथे पोहचल्यावर तो वाघ्याच्या वाडीत राहतो असे गावच्या पोलिस पाटलाकडुन समजले. त्याचा मोबाईल नंबर घेत त्यास फोन केला तर सुरेश बाहेर असल्याचे घरच्यांकडून समजले. घोर निराशा झाली. सांगणोरे गावच्या उत्तरेला दक्षिणोत्तर विस्तार असलेला हा रांजणा डोंगर दिसून येत होता. या डोंगरावर पोहचण्यासाठी जवळची वाट स्थानिकांना विचारली तर त्यांनी पुढे गवारवाडीतुन जावा म्हणून सांगितले. गवारवाडीत पोहचताच तेथील स्थानिकास डोंगर माथ्यावर जाण्यासाठी वाट विचारली तर त्यांनी समोरच असलेल्या टेकडीवरून जावा सांगितले व पुढे खिंडीतून डोंगराच्या पुर्वेकडुन जावा सांगितले.
आम्ही आता दुचाकी पार्क करत चढाईला सुरुवात केली होती. आम्ही मळलेली धाकड पाऊलवाट पकडून वर टेकडीकडे चालू लागलो होतो. समोरच तेलनीचा सुळका मात्र आमचे स्वागत करायला उभा होता. पहीला टेकडीचा टप्पा करवंदे अर्थात रानमेवा चाखत पार करत पुढे रांजणाच्या मुख्य डोंगर वाटेला लागलो होतो. या दोन्ही डोंगराची हीच खिंड समजून आम्ही रांजणा डोंगराला पुर्वेकडुन वळसा घालायला सुरुवात केली. मळलेली पायवाट आता फिकी होत चालली होती. शंकेची पाल चुकचुकली होती परंतु येथे कुणाला विचारावं म्हटलं तरी आम्ही तिघे सोडून कुणीच नव्हते. शेवटी नेहमीची पाहण्यात असलेली एक नाळ समोर होतीच. याच नाळेतील पावसाळी दृश्य पाहण्यासाठी मी कितीतरी वेळ येथे दृष्य न्याहाळत बसायचो. येथे स्वर्ग अवतरल्याचा येथील दृश्य पाहून भास व्हायचा. कारण एकसाथ एवढे वाहणारे धबधबे मी माझ्या आयुष्यात कधीच पाहीले नव्हते. जवळपास दीडशे ते दोनशे फेसळणारे धबधबे या घळीत पडताना पाहून डोळ्यांचे पारणे फिटत नाही तो पर्यंत मी येथेच थांबुन रहायचा. आज त्या कोरड्या पडलेल्या नाळेतुन प्रवास करावा लागणार होता हे पाहुन तर खूप अत्यानंद झाला होता. कातळकड्यावरचा खडतर पुढील प्रवास आमचा चालू असतानाच सुरेशचा फोन प्रशांतला आला. कुठं आहे विचारणा केली. आम्ही डोंगराच्या पुर्वेकडुन घळीकडे जात असल्याचे सांगितले. क्षणात सुरेशने माघारी पुर्वेकडे या असे सांगितले. पुढे वाट आहे परंतु जवळपास ५० फुटांचे दोन कडे चढून जाण्यासाठी रोप लावावे लागतात व चढाई करूनच पुढे जाता येत अन्यथा नाही. तिघांचे मन खिन्न झाले व आल्या पावली आम्ही पुर्वेकडुन पुन्हा माघारी पावलांनी पश्चिमेस वळसा घालायला सुरुवात केली. येथेच पाऊनतास वेळ गेला. पश्चिमेकडुन सुरेश आमची वाट पाहतच होता. जेथे आम्ही पोहचलो तेथेच वर खिंड होती. ती चढाई करून आम्ही पठार भागावरून पुर्वेस वेढा दिला.
सुरेश सांगत होता की या मार्गाला फरारी असे म्हणतात व रांजणावर पोहचण्याचा हा सर्वात लांबचा मार्ग आहे. येथुन पुढे माथ्याकडे आम्ही चालू लागलो होतो. येथुन पिंपळगाव जोगा धरणाचे विहंगम दृश्य पहायला मिळत होते. समोरच हटकेश्वराची डोंगर रांग व माथ्यावर असलेला नैसर्गिक पुल भेटीसाठी खुणावत होता.तर उत्तरेला समोरच माथ्यावर एकावर एक दगडी रचलेले दिसत होते. ते पाहुन खुप आनंद झाला. मला वाटले की या तटबंदीच्या खुणातर नाही ना? कारण लांबुन हे ओळखणे अवघड होत. जसजसं जवळ जवळ जाऊ लागलो तसं तसा चेह-यावरचा आनंद मावळतीकडे चालला होता. जवळ गेल्यावर समजले की ही नैसर्गिक कलकृती आहे व वातावरणाचा खडकावर झालेल्या झिजेमुळे हे घडले होते. त्याचा अनुभव घेत पुन्हा पुढे चालू लागलो. प्रशांत आणि राजकुमारची चांगलीच दमछाक झाली होती. ते सांगत होते एवढी चढाई प्रथमच अनुभवत आहोत. गप्पा गोष्टी करत आम्ही रांजणाच्या माथ्याच्या उत्तरेकडे पोहचलो होतो. येथुनच मळलेली वाट माथ्यावर गेलेली निदर्शनास पडलेली दिसली. आजुबाजुला असलेला परीसर पाहता हा भाग किल्ला असेल असे वाटत नव्हते. पुढे चढाई चालू ठेवली. लांबूनच खडकात कोरलेली पाण्याची दोन टाकी निदर्शनास पडली. मावळलेला आनंद पुन्हा भेटी आला. टाक्याजवळ निरीक्षण करता आजुन सोबतच पुर्वेकडुन गाडलेली दोन टाके पहावयास मिळाले. आजुन काही भेटते का पहायला सुरुवात केली परंतु दुसरे काहीच नव्हते.
आता शेवटची माथ्यावरची चढाई शिल्लक राहीलेले होती. अंतर थोडेच होते. ते गाठण्यासाठी पाय त्या दिशेने वाटचाल करु लागले. माथ्यावर पोहचल्यावर थंड जोराच्या वाहणाऱ्या वाऱ्याचा आनंद घ्यायला भेटणार होता कारण चढाईने तापलेले शरीर थंडावा मागु लागले होते. माथ्यावर लावलेले भगवे दोन झेंडे जोरात फडफडत होते. शेवटी माथ्यावर आम्ही पोहचलो खरे परंतु हवा मात्र शून्य होती. डोक्यावर असलेले झेंडे मात्र वेगाने फडफडत होते. काय जादू झाली काही समजत नव्हते. सर्व हवा वरचेवरच वाहत होती. खाली मात्र काहीच हवा लागत नव्हती. रांजणा डोंगर माथ्यावरून हटकेश्वर नैसर्गिक पुल, किल्ले हडसर, किल्ले निमगिरी, किल्ले सिंदोळा,उधळ्या डोंगर, वाघ्या डोंगर, एम.टी.डी.सी रेसॉर्ट, दुरवरून डोकावणारा ढाकोबाचा माथा, पिंपळगाव जोगा धरणाची पुर्व व पश्चिम भिंत, हरीश्चंद्रगड बालेकिल्ला, तारामती शिखर व कुंजरगड आदि परिसराचे विहंगम दृश्य पहायला मिळत होत. विशेष म्हणजे या डोंगर माथ्यावर अनेक ठिकाणी कातळात कोरलेले अनेक चौकोनी आकाराचे खड्डे व एक छोटीशी पाण्याची टाकी व रांजणाच्या आकाराचे दोन तोंडाशी कोरीवकाम केलेले खड्डे निदर्शनास पडले याच वरून या डोंगराचे नाव रांजणा असे पडले असावे असे वाटते. तेथील परीसर व संपुर्ण परीसरात फिरून पाहीले असता तो किल्ला न वाटता यावरुन अकोले व जुन्नर परीसरवर लक्ष ठेवण्यासाठीच या डोंगर माथ्याचा वापर होत असावा असे एकंदरीत वाटले.
आकाशी काळे ढगांची गर्दी झाली होती. परतीचा प्रवास आल्या मार्गाने न करता गायधरा मार्गे करायचा होता. सुरेश ने त्याच्या घरी चटनी भाकरीची पोटापाण्याची सोय केली होती. नको नको म्हणुन सुध्दा त्याने आमचे काहीच ऐकले नव्हते. गायधरामार्गे आम्ही लोहकरे वाडीत उतरुन सुरेश राहत असलेल्या वाघ्याच्या वाडीत प्रवेश करणार होतो. सुरेश सांगत होता की सांगणोरेच्या गवारवाडीतुन - फरारीमार्गाने , लोहकरेवाडीतुन - गायधरामार्गाने, व - वाघ्याचीवाडीतुन - टकोरीमार्गाने या रांजणावर चढाई करता येते व पुढे फोफसंडीच्या कुंजरगाला गवसणी घालता येते. परतीच्या प्रवासाला आम्ही लागलो होतो. राजकुमारचा पाय दुखू लागला होता परंतु तो तसाच ओढत चालत होता. आता आम्ही गायधराने खाली उतरुन मालकीच्या जंगलात प्रवेश केला होता. पिकलेले गावठी अंब्यांचा झाडाखाली पडलेला सडा पाहुन आम्ही तेथेच आंब्यावर मनसोक्त ताव मारला व उरलेल्या आंब्यांचे गाठोडे घेऊन पुन्हा चालू लागलो.
आता आम्ही डांबरी रस्त्यावर आलो होतो. येथे बाकावर राजकुमार व प्रशांत यांना बसवत सुरेश आणि मी आमच्या दुचाकी आणण्यासाठी एका दुसऱ्याच्या बाईकवर बसून गवारवाडी गाठली. दुचाकी घेत निघालो होतो. रस्तात प्रशांत व राजकुमार यांना घेत सुरेशचे घर गाठले. सुरेशच्या पत्नीने सुग्रास जेवणाची उत्कृष्ट सोय केली होती. जेवणाचा आस्वाद घेत व सुरेशचे आभार व्यक्त करत आम्ही खिरेश्वर मार्गे हेमाडशैलीतील नागेश्वर मंदिर व तेथील लेण्यांचे दर्शन घेत पुन्हा परतीला लागलो होतो. गप्पा गोष्टी करत जुन्नर जवळ आलं होतं. येथेच आम्ही आपापल्या घरी जाण्यासाठी व थकवा घालवण्यासाठी टाटा बाय बाय करत मार्गस्थ झालो होतो तो ते थकलेल्या शरिराला आराम देण्यासाठी.
✍️ रमेश खरमाळे, माजी सैनिक
१. लोकहित (अळकुटी परिसर विशेषांक - २०१०)
२. डॉ. सदाशिव शिवदे यांचा लेख - ' सरदार कदमबांडे यांचा वाडा '
३. पुणे जिल्हा गॅझेटीयर
४) https://www.discovermh.com/kukdeshwar-temple-info/
५) https://www.misalpav.com/node/26630
६) http://sagarshivade07.blogspot.com/2013/12/blog-post.html
७) https://pankajsamel.wordpress.com/2018/06/17/shilahar-king-zanj-and-shivtemples/
८) श्री. रमेश खैरमाळे, श्री, सुरेश शिंदे यांचे लिखाण
१०) मराठी रियासत - गो.स.सरदेसाई


























































































































































.jpg)






































































































































































































































































































































































































No comments:
Post a Comment