MyHistoryPost

Monday, May 16, 2022

चावंड

  सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्रातील पहिले राजघराणे. इतिहासात खोलवर डोकावले असता आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला अन् त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी अशा बुलंद किल्यांची निर्मिती झाली. त्या काळी नाणेघाटा पासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गांवी बाजारपेठ वसली गेली. सातवाहन यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले व सारा सह्याद्री गडकोटांनी सजला. यातील एक किल्ला म्हणजे किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड. या गडाची अनेक नावे आहेत. चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने गडावरील एकाच ठिकाणी असलेल्या सात पाण्याच्या टाक्यांचा संबंध सप्तमातृकांशी जोडला जातो. चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे तर प्रसन्नगड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवले
चावंडचे हवाई दृष्य





कुकडेश्वरच्या रस्त्यावरुन दिसणारा चावंडचा घेर !

चावंडची विवीध रुपे
चावंड

जुन्नरचा परिसराचा इतिहास हा सुमारे २००० वर्ष जुना! हा प्रदेश म्हणजे 'भौगोलिकदृष्ट्या' आणि 'ऐतिहासिकदृष्ट्या' महाराष्ट्राचा शिरेटोप म्हणता येईल. सातवाहन राजांच्या कालापासून हा प्रदेश प्रसिद्ध तर आहेच, पण महाराष्ट्रातील प्रदेश नागरी वस्तीखाली यायला, व्यापारदृष्ट्या येथून सुरुवात झाली असे कळते. तेव्हा हा प्रदेश सातवाहनांची उपराजधानी होती. या परिसरात नाणेघाट व दाऱ्याघाट हे प्राचीन व्यापारी मार्ग, ९ तीर्थक्षेत्रे, भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, हरिश्चंद्रगड असे अभेद्य किल्ले, अष्टविनायक गणपती पैकी एक ओझरचा गणपती, लेण्याद्रीच्या बौद्ध लेणी, मानमोडी डोंगरातील जैन गुंफा , ५ धरणे आणि व्याघ्र प्रकल्प आहेत. याजोडीला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यात स्वर्ग आहे.
   जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी . यांपैकी चावंडकिल्ला जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे.चहूबाजूंना सरळसोट कातळकडे असलेला हा बेलाग दुर्ग म्हणजे जुन्नरच्या शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या दुर्ग चौकडीतील एक अनोखं रत्न आहे.
  चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चामुंडा हे देवीचे क्रूर रूप , या रुपात सर्व काही भयानक, अमंगल ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे. या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत; चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव.
      या प्रदेशाचा सातवाहन राजघराण्याचा असलेला सबंध पहाता कदाचित हा दुर्ग हि सातवाहनांची निर्मिती असावी.मात्र त्याचे थेट कोणतेही पुरावे नाहीत. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा. असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौखिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.
  इतिहास :-
 जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.
जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.
 जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन.
चावंड उर्फ प्रसन्नगडाला सातवाहन, बहामनी, निजामशाही, अदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज असा मोठा व प्राचीन इतिहास लाभलेला आहे. नाणेघाटातून येणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली.
 अर्थात इतिहासाचा विचार केला तर चावंडचा पहिला उल्लेख येतो तो पंधराव्या शतकात.बहामनी कागदपत्रात चावंडचा उल्लेख जोंदचा किल्ला असा आहे.हा उल्लेख बहामनी इतिहासकार सय्यद तबातबा याने लिहीलेल्या 'बुर्हाणे मासिर' या फारसी भाषेत लिहीलेल्या ग्रंथात आलेला आहे.सन १४८२-८३ मध्ये मलिक नायबचा मुलगा अहमद याने कोकण व दक्षिणेकडील डोंगराळ भागात केलेल्या मोहीमेचा वृत्तांत लिहीताना अहमदचा हि स्वारी करण्याचा काय उद्देश होता? याविषयी तबातबा लिहीतो,'अहमदची इच्छा इस्लामला उच्च पातळीवर नेण्याची, जिहाद पुकारुन महमद पैगंबरानी सांगितलेल्या श्रध्देच्या आणि पवित्र तत्वाचा प्रसार करायचा आणि श्रध्दा आणि नेकी यांचा आभाव असणार्या काफिरांचा बीमोड करणे हा होता.कोकण आणि दक्षिणेकडील डोंगराळ भागात असणारे किल्ले कफिर आणि मुर्तीपुजकांच्या ताब्यात होते.त्यांच्याकडून व्यापारी आणि प्रजाजनांना उपद्रव पोहचत असल्यामुळे सुव्यवस्थेच्या दृष्टीने ते किल्ले शत्रुच्या ताब्यातून सोडवणे आवश्यक होते.म्हणून अहमदने लष्करात बक्षीशी वाटली आणि थोड्याच अवधीत पायदळ आणि घोडदळाची मोठी फौज उभी केली'.
      अर्थात सय्यद अलीने अहमदची मोहीम धार्मिक कारणामुळे काढली असे लिहीले असले तरी हा काळ राजकीय अस्थिरतेचा होता.अहमदची हि स्वारी राजकीयदृष्ट्या बस्तान बसविण्यासाठीच होती. इ.स.१४८२ मध्ये महमुद बहामनी ( तिसरा ) याचा मृत्यु झाला. आपल्या मृत्युपत्राद्वारे त्याने मलिक नायबला बहामनी राज्याचा विश्वस्त आणि आपल्या अज्ञान मुलाचा म्हणजे महमुदशहाचा पालक म्हणून नेमले होते.नंतर मलिक नायबने त्याच्या मुलाची म्हणजे अहमदची दौलताबादवरुन जुन्नरला फौजदार म्हणून बदली केली आणि बीड व दौलताबाद प्रांताचे बरेचसे परगणे जुन्नरला जोडले.पण बहामनी राजवटीशी एकनिष्ठ असणार्‍या बर्याच सरदारांना न जुमानणार्‍या मराठी सरदारांच्या ताब्यात होते.ते किल्ले म्हणजे चावंड, लोहगड, तुंग, कुवारी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले ताब्यात घेण्याची जबाबदारी मलिक नायबने अहमदवर सोपवली. यातूनच अहमदची कोकण मोहीम उदभवली.
 या मोहीमेचे वर्णन सय्यद अली असे करतो 'अहमदने शिवनेरी किल्ला जिंकला आणि त्याने तो मातबर सरदाराच्या हवाली केला.त्यानंतर त्याने शिवनेरीच्या परिसरात असणार्‍या जोंद किल्ल्यावर हल्ला केला.विशेष प्रतिकार न होताच जोंद किल्ला ताब्यात आला.या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. जुंड किल्ल्याची व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून लोहगडाकडे मोर्चा वळवला.
मुर्तजा निजामशहा
 
यानंतर चावंडचा पुढील उल्लेख मुर्तजा निजामशहाच्या कारकीर्दीत ( स.न.१५६५-१५८८) येतो.मुर्तजा निजामशहा हा हुसेन निजामशहाचा मोठा मुलगा.त्याच्या काळात त्याने अलि आदिलशहाच्या उदगीर किल्ल्यावर स्वारी केली आणि तो काबीज केला.त्या किल्ल्याची डागडुजी करुन त्याची व्यवस्था एका विश्वासु अधिकार्यावर सोपवून तो अहमदनगरला परत आला.दरबारात त्याचा मुख्य प्रधान होता खानेखानान मौलाना हसन तब्रिजी.हा विद्वान होता.पण मुर्तजा निजामशहाने नेमणुक केलेल्या शहा हैदर आणि शहा जमालुद्दीन हुसेन इंजु या मोठ्या पदावरच्या अधिकार्यांनी खानेखानानविरुध्द मुर्तजाचे कान भरायला सुरवात केली. त्यामुळे मुर्तजा निजामशहाची खानेखानानवर खप्पा मर्जी झाली आणि त्याची रवानगी जोंद किल्ल्याच्या कैदखान्यात ( म्हणजे चावंडवर ) झाली. 
     बुर्हाने मासीरचा लेखक सय्यद अली याचे कारण वेगळेच सांगतो.त्याचे कारण म्हणजे मुर्तजा निजामशहाची आई खनुजा हुमांयु हिचा खानेखानान विरोधक होता. वास्तविक खानेखानान हा मुर्तजाशी एकनिष्ठ होता.खनुजा हुमांयुचे निजामशाहीत वाढलेले प्रस्थ त्याला मान्य नव्हते.पण केवळ स्वतःच्या आईशी केलेला विश्वासघाताचे फळ म्हणून मुर्तजाने आपल्याच एकनिष्ठ सरदाराला कैदेत टाकले.
     मात्र या घटनेचे वर्णन गुलशने इब्राहिमीचा लेखक फरिश्ता वेगळ्या दृष्टीकोणातून करतो.त्याच्यामते या घटनेला कारणीभुत खानेखानानने इनायततुल्लाचा कपटाने केलेला खुन आणि त्यानेच मुर्तजाला इब्राहिम कुतुबशहाची छावनी लुटून फस्त करण्याचा सल्ला दिला.
    कारण काहीही असो, खानेखानानला चावंडवर तुरुंगवास नशीबी आला हेच सत्य ! 
पुढे मुर्तजा जेव्हा पुन्हा जुन्नर परिसरात आला आणि तो चावंड म्हणजेच जोंड किल्ल्यापाशी आला तेव्हा त्याला आपल्या या वजीराची म्हणजे खानेखानानची आठवण झाली. त्याने केलेला मौलाना इनायतखानाचा छळ आठवला आणि त्याने त्याचा सरदार बिसतखानाला हुकुम दिला कि 'खानेखानानने जसा इनायतखानाचा छळ केला तसाच छळ त्याचाही करण्यात यावा'.
पुढे चंगीजखानाच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली. तिथून खानेखानान निघून बुर्हाणपुरच्या सुलतान रजा अलिखान याच्या पदरी राहिला.
      याच मुर्तजाच्या काळात डिसेंबर १५८४ मध्ये त्याचा सरदार सलाबतखानाने वर्हाडातील इमादशाही सैन्यावर मोठा विजय मिळवला.त्यामुळे त्याचे महत्व निजामशाही दरबारात वाढले.पुढे वकीलाच्या हुद्द्यावर स्थिरता लाभल्यावर त्याने पुर्ण निजामशाहीचा कारभार हाती घेउन दरबारातील आधीचा वजीर असदखानाला हुद्द्यावरुन काढून टाकले व त्याची रवानगी जोंडच्या किल्ल्यातील कैदखान्यात म्हणजे चावंडवर केली. 
 दुसरा बुर्हाण निजामशहा

यानंतर चावंडच्या उल्लेख दुसर्‍या बुर्हाण निजामशहाच्या कारकिर्दीत ( सन १५९०-१५९४ ) येतो. निजामशहाची रेवदंड्याच्या पोर्तुगीजांविरुध्द युध्दाची तयारी सुरु असताना जोंडच्या किल्लेदाराने त्याला बातमी पाठवली कि 'अमजाद उल मुल्क मेहेदवी याच्या नेतृत्वाखाली तुमच्या विरुध्द बंड करण्याची तयारी सुरु आहे.अमजादने ( अहमदनगरच्या किल्ल्याच्या ) नायकवडींना पैसे चारले आहेत.बादशहांचा मुलगा शहाजादा इस्माईल याला किल्ल्यातून सोडवून आपल्या हवाली करुन सोडवावे.म्हणजे त्याला पुढे करुन बंड करता येईल असा आमजाद्चा डाव आहे'
 अर्थात बुर्हाण निजामशहाला याची कुणकुण आधीच लागलेली होती.शिवाय विजापुरचा हेजीब रशीद उल मुल्क यानेही त्याला खबरदार केले होते.मात्र बंडखोर जोपर्यंत पुढचे पाउल उचलत नाहीत तोपर्यंत काही हालचाल करायची नाही असे त्याने ठरवले.आधी त्याने अमजाद उल मुल्कला त्याच्या जहागिरीवर जाउन रहाण्याची आज्ञा केली.यानंतर त्याला बोलावून त्याची चौकशी करुन गुन्हा सिद्ध झाला तर योग्य अधिकार्‍याच्या हवाली करुन शिक्षा फरमावायची असा बुर्हाण निजामशहाचा विचार होता. पण अचानक काय घडले ते समजत नाही.एके दिवशी दरबारात महालदारखानाने अमजादला ओढत आणले व त्याची आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करण्यात आली. अमजादचे डोळे काढण्यात आले आणि त्याच्या साथीदारांना हालहाल करुन ठार मारण्यात आले. पुढे अमजादही मरण पावला.मात्र बुर्हाण निजामशहाला सावध करणार्‍या चावंडच्या त्या किल्लेदाराचे नाव इतिहासाला माहिती नाही.
चांदबीबी
 
 चावंड किल्ल्याचा आणखी एक उल्लेख निजामशाहीतच आहे.हि घटना इ.स.१५९४-९५ दरम्यानची. आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वजीर मिया मंजू जानीबेग याने धन्याशी बेईमानी करुन अहमदनगरचा किल्ला आणि निजामशाहीचा कारभार हातात घेतला. त्याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्यावेळी त्यांने इब्राहीमचा अल्पवयीन मुलगा बहादूरशहा याला चावंडला बंदिवासात ठेवले. बहादूरशहा (इ.स. १५९४-१५९५) वर्षभर या किल्ल्यावर कैदेत होता. पण याचवेळी नगरच्या किल्ल्यात होती चांदबीबी ही इब्राहीम निजामशाहची बहिण व त्याचा मुलगा बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. निजामशाहाच्या दरबारातील सिद्दी सरदारांनी तीचा पक्ष उचलून धरला.सिद्दी सरदारांनी मिंया मंजुला असे सुचवले कि बहादुरशहाला गादीवर बसवून चांदबीवीला त्याचे शाही पालकत्व द्यावे.हा बहादुरशहा त्यावेळी फक्त एक वर्षाचा होता.पुढे मिंया मंजुने चांदबीबीला कैद केले व तीला मारायची योजना आखली. हे कारस्थान दरबारातील निजामशाही सरदार इखलासखान व इतर सिद्दी सरदारांना पटले नाही.पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे माहित झाल्यावर बंड केले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला.दि. ५ सप्टेंबर १५९५ रोजी इखलासखान व सिद्दी सरदारांनी अहमदनगरच्या काळ्या चबुतर्‍यानजीकच्या मैदानावर फौजा जमविल्या.मिंया मंजुने नगरच्या किल्ल्याच्या तटबंदीवर शाही तख्तावर अहमदला बसविले आणि आपल्या मुलाला म्हणजे मिया हसनला ७००० घोडेस्वार देउन इखलासखानावर पाठविले.मात्र लढाईत मिया हसनचा पराभव झाला व तो नगरच्या भुईकोटात पळून गेला. इख्लासखान याने चावंडच्या किल्लेदाराला बहादूरशहा याला आपल्या हवाली करण्यास हुकूम पाठवला पण किल्लेदाराने मिया मंजू याच्या हुकुमाशिवाय हे शक्य नसल्याचे कळवले.इकडे मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले पण तो तीस हजाराचे मुघल व राजपुत घोडेस्वार घेउन अहमदनगरच्याच किल्ल्यावर चालून आला. त्याआधी मिंया मंजुने इखलासखानाचा पराभव केला होता,बोलावून घेतलेला पाहुणा उलटलेला पाहून आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान याला व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहाकडे मदत मागण्यास औसामार्गे भागानगरला गेला असता चांदबीबीने त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची सुटका करत त्याला सुलतान म्हणून जाहीर केले. तीने शहाजादा मुरादविरुध्द युध्द पुकारले.मोठ्या धैर्याने आणि शौर्याने तीने मोघलांचे आक्रमण परतवून लावले.मुघल सैन्याने माघार घेतल्यावर तीन दिवसांनी मिंया मंजु अहमदला घेउन नगरच्या किल्ल्याजवळ येउन पोहचला.त्याला वाटले आता तरी दरबारी सरदार अहमदला स्विकारतील.पण झाले उलटेच.किल्ल्यातील लोकांनी त्याला स्विकारले तर नाहीच उलट किल्ल्याच्या आतही येउ दिले नाही.नेहंगखानाने किल्ल्याचा दरवाजा बंद करुन घेतला.
  निजामशाहीच्या या संघर्षात चावंड किल्ल्याचा तुरुंग म्हणूनच वापर झालेला दिसतो. पेशवाईमध्ये मराठ्यांचे साम्राज्य अटक ते कटक असे पसरले असल्यामुळे किल्ल्यांचे महत्व उणावले अस्ल्यामुळे बहुतेक गडांचा कारागृह म्हणून वापर केला गेला.अगदी राजधानी रायगडाचा देखील तुरुंग म्हणून वापर केलेला दिसतो.अर्थात त्याआधी काही गडांचा कारागृह म्हणून वापर झालेला दिसतो.उदा. शिवकाळात सोनगड्,वासोटा यांचादेखील तुरुंग म्हणून वापर झालेला आहे.
     अर्थात निजामशाही कालातील मुलकी व सामाजिक इतिहास सांगणारी कागदपत्रे फारशी मिळत नाहीत.त्यामुळे या काळात चावंडसारख्या किल्ल्यांवर फक्त राजकीय कैदी ठेवत कि इतर आरोपीही कैदेत असत हे आज समजत नाही.
 
  शहाजी महाराज

 यानंतर चावंडचा उल्लेख मिळतो तो निजामशाहीच्या अस्ताला.शहाजी राजांनी इ.स.१६३३ ते १६३६ या कालावधीत जीवाचे रान करुन निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.पण त्यात त्यांना यश आले नाही.१६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी माहुलीगडाच्या पायथ्याशी शरणागती पत्करुन केलेल्या तहानुसार लहानग्या मुर्तीजा निजामशहाला मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले.त्याचबरोबर त्यांनी आपली काही विश्वासु माणसे व किल्ल्याचा ताबा देण्याविषयक पत्रे अबु सईद याच्याबरोबर देउन त्याला मुघल सरदार खान जमानकडे पाठवावे लागले.त्यावेळी मोघलांच्या हवाली करण्यात जे गड होते त्यात चावंड मोगलांना मिळाला. 
     शिवकाळात चावंड किल्ल्याबद्दलचा उल्लेख पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथात मिळतो. या काव्यग्रंथाचा कर्ता कवी जयराम पिंडे तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांना शिवाजी  महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीचे कोणकोणते किल्ले कसे जिंकले यांचे वर्णन करताना ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील ३७ व्या श्लोकात चावंडचा उल्लेख करतो.
                                             तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च। 
                                             महिषोष्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।। 
       याचा अर्थ असा कि त्याचप्रमाणे चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे (किल्ले) सुद्धा (शिवाजी महाराजांनी) निकराने लढून घेतले.परंतु या श्लोकाला दुजोरा देईल असा समकालीन अन्य पुरावा मिळालेला नाही.कदाचित  मे १६७२-७३ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेर्,अहिवंत्,रवळ्या-जवळ्या,मार्किंडागड,अचला हे गड जिंकुण घेतले होते.त्याच सुमारास हडसर-जीवधन आणि चावंड उर्फ चामुंडगड जिंकला असावा.तेव्हा त्याचे नाव प्रसन्नगड ठेवले असावे. अर्थात यासाठी देखील सबळ पुरावा नाही.पण शिवकाळातच चावंडचा प्रसन्नगड झाला.पण शिवकाळात राजाभिषेकाच्या आदल्या वर्षी म्हणजे मे १६७३ च्या सुमारास ब्रिटीश डॉक्टर फ्रायरने जुन्नर परिसराला व शिवनेरीगडाला भेट दिली. त्याचे तो आपल्या पुस्तकात वर्णन करतो.त्यात शिवनेरीवरची फौज शिवाजी महाराजांच्या सैन्याशी मुकाबला करण्यासाठी खाली उतरली असे लिहीले आहे.याचा अर्थ यावेळी शिवाजी महाराजांचे सैन्य जुन्नर भागातील चावंड्,हडसर्,जीवधन जिंकून घेण्यासाठी या परिसरात आले असणार.
     संभाजी महाराजांच्या काळात चावंड मराठ्यांच्या ताब्यात होता कि नाही हे आपल्याला पुराव्या अभावी समजत नाही, परंतु इ.स.१६९४ मध्ये औरंगजेब स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत आला असता छत्रपती राजारामाच्या काळात त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकला व सुरतसिंग गौंड याला किल्लेदार म्हणून नेमले पण तो तिथे येऊन पोहचण्यापुर्वीच मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. 
  त्याच्या नोंदी आपल्याला मुघल दरबाराच्या अखबारात वाचायला मिळतात.त्या अशा:
१) ता.१६ डिसेंबर १६९४: मनोहरदास गौड ( हा शिवकाळात माहुलीचा किल्लेदार होता ) याचा नातु सुरतसिंग गौड याला चौंडची किल्लेदारी देण्यात येउन त्याची मनसब वाढविण्यात आली.त्याला ४०० जात व २०० स्वार अशी मनसब होती.ती १०० स्वारांनी वाढविण्यात आली.
२) ता.८ जानेवारी १६९५ : गजिउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला. त्याच्या सोन्याच्या किल्ल्या व गाजिउद्दीनचा विनंतीअर्ज बादशाहाच्या नजरेखालून गेला.
३) ता.१५ जुलै १६९५: जुन्नरचा किल्लेदार व फौजदार मन्सुरखान याने अर्ज केला होता कि, 'मी या भागाची उत्तम प्रकारे व्यवस्था पहात आहे.मला जौदगडची ( म्हणजे चावंडची ) पण किल्लेदारी मिळावी.
   अर्थात बादशहाने ते मान्य केले नाही.गाजीउद्दीन बहादुर फिरोजजंग याला लिहून दुसर्‍या कोणाची तरी नेमणूक करावी अशी बादशहाने आज्ञा केली.या नोंदीवरुन मराठ्यांनी अल्पकाळ का होईना  चावंड जिंकुण घेतला होता हे स्पष्ट होते.
   यानंतर महाराणी ताराबाईच्या कारकीर्दीत चावंडच्या किल्लेदाराच्या नेमणुकीबद्दल एक नोंद अखबारात मिळते, ती अशी
        ता २१ सप्टेंबर १७०४ जौदचा किल्लेदार आणि माधवसिंह कछवाचा मुलगा शामराव याची मनसब जुन्नरचा किल्लेदार व फौजदार अजीजखान याच्या शिफारसीवरुन वाढवण्यात आली,यावेळी औरंगजेबाचा मुक्काम माकरी ( पागरी ) येथे होता.या नोंदीत चावंडच्या किल्लेदाराचे नाव आले आहे.तेव्हा २१ सप्टेंबर १७०४ पर्यंत तरी तो किल्ला  मुघलांकडेच होता हे नक्की.
      पुढे पेशवेकाळात किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. १० ऑगस्ट १७४९ रोजी चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते यांच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडलेली आहे.यात भांडी,घरगुतीवस्तू,हत्यारे,पाळीव प्राणी यांची नोंद आहे.
 इ.स.१७७६ मध्ये देशमुख/नाईक संताजी शेळकंदे यांच्या नेतृत्वाखाली महादेव कोळी लोकांनी पेशावांकडून किल्ला ताब्यात घेतला अशी नोंद आहे.
इ.स.१७८५-८६ मध्ये माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत पेशव्यांचा कैदखाना या गडावरच असल्याचा उल्लेख येतो. याचा उल्लेख असा येतो 'माधवराव कृष्ण भिंगारकर हे किल्ले चावंड, तालुके शिवनेर येथे अटकेत आहेत.त्यांस मशारनिल्हे वृध्द व अशक्त सबब त्यांची स्त्री त्यांच्याजवळ राहणार.त्यास किल्ले मजकुरी मशारनिल्हेजवळ ( माधवकृष्ण जवळ ) ठेवून पोटास ( शिधा ) शेर शिरस्ताप्रमाणे ( म्हणजे नियमानुसार ) देत जाणे म्हणून बाळाजी महादेव यांचे नावे सनद.
इ.स. १८१८ च्या शेवटच्या इंग्रज-मराठे युध्दात चावंडचा किल्ला इंग्रजांनी कसा जिंकून घेतला याबध्दल "Pendhari and Maratha war papers" page no. 294 मध्ये हकीकत आली आहे.
   A British brigade was send to take Chavand.The brigrade encamped before Chavand on 1st May and demanded its surrender. The commandant refuses to surrender unless directed by his master.A fire of Mortar and Howitzer was began in the evening and bombardment continue till next morning during which about hundred shells were fired.Then the garrison of upwards of 150 Maratha surrendered unconditionally. They were disarmed and dismissed to their village.
   वरील हकीकतीचे भाषांतर खालील प्रमाणे :
   २५ एप्रिल १८१८ मध्ये इंग्रजांनी जुन्नर ताब्यात घेऊन सैन्याची एक तुकडी चावंडला पाठवली. दि १ मे १८१८ रोजी ती तुकडी चावंड किल्ल्याजवळ येउन पोहचली.त्यांनी  चावंडच्या किल्लेदाराला किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला पण किल्लेदार बुधाजी भालचीम यांनी नकार दिला. धन्याच्या आदेशाशिवाय किल्ला सोडणार नाही असा उलट निरोप किल्लेदाराने पाठविला. इंग्रजांनी मॉर्टर व हॅवित्झर तोफांनी किल्ल्यावर मारा करायला सुरवात केली. तो मारा दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत सुरुच होता. इंग्रजांनी किल्ल्यावर १०० तोफगोळ्यांचा भडीमार केल्याने किल्लेदाराला शरण जाणे भाग पडले. इंग्रजांनी त्यांना निशस्त्र केले आणि त्यांना त्यांच्या गावाकडे जाउ दिले.मात्र या लढाईचे सविस्तर वर्णन जसे इंग्रजांची तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली आली होती,त्यांनी किल्ल्यावर कोणत्या बाजुने मारा केला ,इंग्रजांच्या हल्ल्यात मराठ्यांची किती हानी झाली,त्यांना किल्ल्यात काय बघायला मिळाले अश्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. इंग्रजांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या वाटेवर सुरुंग लावून पायऱ्यांची तोडफोड केली.  
जायचे कसे?
      पुण्यापासून : पुणे ते जुन्नर एस.टी. बस किंवा स्चतःच्या वाहनाने जाता येईल. बसने प्रवास करायचा तर जवळपास अडीच तास लागतात. शिवाजीनगर पासून दर अर्ध्या तासाला बस असते. पुण्यातून पुणे-नाशिक महामार्गावरुन पुणे-चाकण-राजगुरुनगर-नारायणगाव-जुन्नर असे जाता येते.
मुंबईवरुन जुन्नरला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१) मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर असा रस्ता असून हे अंतर ११३ कि.मी.आहे.या मार्गे अडीच तास लागतात.
२)  मुंबई -लोणावळा-चाकण-नारायणगाव-मंचर हे अंतर २०० कि.मी.असून यामार्गे चार ते पाच तास लागतात..
नवीन जुन्नर बस स्थानकापासून १६ किमी अंतरावर असलेल्या ह्या गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. जुन्नर स्थानकापासून अंजानावळ वा घाटघर  बस पकडून चावंड फाट्यावर उतरावे. जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे पण वारंवारता कमी आहे.चावंड फाट्यापासून १५ मिनिटे चालत गेल्यावर चावंड गाव लागते. त्याच्या अलीकडेच किल्ल्याच्या पायऱ्या चालू होतात. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
   बसच्या वेळा :
चावंड, कुकडेश्वर, नाणेघाट जाण्यासाठी :
१. जुन्नर ते घाटघर/अंजनावळ : सकाळी १०, दुपारी- १२:३०, २, ५, ७:३० (शेवटची गाडी मुक्कामी अंजनावळ)
२. जुन्नर ते कुकडेश्वर : सकाळी ११, दुपारी ३:३०
नाणेघाट ते जुन्नर जाण्यासाठी :
१. अंजनावळ (घाटघर फाटा) ते जुन्नर  सकाळी -११, दुपारी -३:३०, ५:३०

चावंडवाडी गाव
गावातून दिसणारा चावंडचा कातळकडा

चावंड किल्ल्याचा नकाशा 
गडाकडे :-
 जुन्नरहून नाणेघाटला जाताना १५ कि.मी.वर चावंडवाडी हे चावंड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गडमाथा गाठण्यासाठी गावाच्या अलीकडेच असलेल्या प्रसन्नगड उपाहारगृहापासुन किल्ल्याची ठळक पायवाट आहे. गडावर जाताना या उपाहारगृहासमोर असलेल्या कुपनलीकेतुन पाणी भरून घ्यावे कारण गडावर जरी पाण्याच्या टाक्या असल्या तरी त्यातील पाणी वापरात नसल्याने पिण्यासाठी योग्य नाही. गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंडला जवळपास सर्व बाजुने ताशीव कडे आहेत.या वायव्य बाजुलाच पाण्याच्या प्रवाहामुळे नाळेसारखा भाग तयार झालेला आहे.दुर्गनिर्मात्यांनी याचाच उपयोग करुन वर जाण्यास वाट कोरली आणि एका अनवट डोंगराला दुर्गलेण्याचे रुपडे मिळाले.

20180211_105810
गडाची माहिती देणारे माहितीफलक
वनखात्याने उभारलेला पर्यटक मनोरा

20180211_105755

20180211_111357
सध्या गडाला जाण्या करीत नवीन पायऱ्या बांधलेल्या आहेत. इथून १५ मिनिटे चढून गेल्यास आपण जुन्या पायऱ्या पर्यंत पोहचतो.जुन्या पायऱ्या खूपच रुंद असल्याने तिथे संरक्षक कठडे बसविले आहेत. इथून चढताना काळजी घेणे आवश्यक आहे.



        चावंडवाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने निघाल्यावर सर्वप्रथम वनखात्याने बांधलेला टेहळणी मनोरा व शेजारी पर्यटकांसाठी बांधलेला निवारा लागतो. येथुन किल्ल्यावर जाण्यासाठी वनखात्याने नव्याने पायथ्यापासूनच काही उंचीपर्यंत सिमेंट च्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे रस्ता वैगरे चुकत नाही आणी सरळ जाऊन आपण एका मोठ्या रॉक पॅचला लागतो. पण खरेतर या पायऱ्यांनीच अर्धा जीव जातो.


जसे आपण थोडे वर वर जाऊ लागतो तसे चावंड गाव आणि माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसू लागते. या धरणामुळे येथे पीक पाणी चांगले असून हा प्रदेश बऱ्यापैकी सधन आहे. या वाटेने साधारण ३०० पायऱ्या चढून गेल्यावर साधारण अर्धातास चढल्यानंतर आपल्याला खडकात खोदलेल्या अरुंद लहान पायऱ्या लागतात.



एकेकाळी या वीतभर पायर्‍या चढायचे म्हणजे कोण दिव्य होते.मात्र आता इथे रेलिंग लावून सर्वसामान्य दुर्गभटक्यांना जाणे सोयीचे केले आहे.सध्या जुन्या रेलिंग काढून येथे नवीन रेलिंग लावलेल्या आहेत. चक्क पर्यटन खात्यातील पैसे या कामासाठी वापरलेले आहेत ( म्हणजे त्यांनी मिळवले आहेत) असे सरपंचांकडून कळले.एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अश्या या पायऱ्या कातळात खोदल्या आहेत. आता नवीन रेलिंग असल्याने त्या पूर्ण सुरक्षित आहेत. लावलेल्या रोपची हि गरज पडत नाही. खरेतर सराईत दुर्गभटक्यांना या रेलिंगची गरज नाही,पण नवे भिडु असतील तर या रेलिंगचा आधार घेतलेला चांगला.  अंदाजे ८० अंशातला हा उभा कडा खोदून त्यात पायर्‍या घडवल्या आहेत. चावंडच्या कड्यांकडे पहाताना एका कवितेतलं कडवं आठवते.
"तासिले कडे अभेद्य,
घडविले दुर्ग बेलाग...
सळसळती मनगटे मराठी,
अन् समशेर ओकते आग ..."
  या पायर्‍या अश्या धोकादायक होण्याचे कारण अर्थात इंग्रज !  इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्‌ध्वस्त केल्या. त्यासाठी जागोजाग सुरुंग लावल्याच्या खुणा आजही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. 



20180211_111534

    साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर कोणा दुर्गप्रेमीने एका खोबणीत आधारासाठी पुरलेली निकामी तोफ दिसते. पुर्वी या तोफेला दोर बांधून लोक वरखाली ये-जा करत असत. साधारण अर्धा फुट व्यास असलेली ही तोफ ३.५ फूट लांब असुन तिचा जमिनीवरील भाग साधारण दीड फुट आहे. चावंडच्या या पायर्‍या एक वेगळंच थ्रिल देऊन जातात.
              या वाटेसंबधीत जी माहीती मिळते ती अशी, शेवटच्या मराठे-ईंग्रज युध्दात जेव्हा हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला तेव्हा त्यांनी किल्ल्याचे बारकाईने निरीक्षण केले.नैसर्गिक कातळकडे आणि नाजुक ठिकाणी बांधलेली तटबंदी यामुळे हा किल्ला मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला तर पुन्हा इं ग्रजांना ताब्यात घ्यायला खुप प्रयास करावे लागणार म्हणून गडावर जाणारी वाट त्यांनी सुरुंग उध्वस्त केल्या.यामुळे गडावरचा राबता तुटेल असा इंग्रजांचा अंदाज होता.मात्र पायथ्याच्या गावकर्‍यांची दैवते गडावरच होती,शिवाय त्यांच्या शेळ्या,मेंढ्याना गडावरचे गवत चरण्यासाठी लागायचे.तसेच एन उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असले कि गडावर असणार्‍या टाक्यात बारमाही पाणी उपलब्ध होई.यासर्व गोष्टींमुळे गावकर्‍यांना गडावर जाण्यासाठी तुटलेल्या वाटेमुळे गैरसोय होउ लागली. त्यांनी त्यातून अफलातून मार्ग काढला.पुर्वी गडावर झालेल्या युध्दप्रसंगी एक छोटी तोफ निकामी होउन पडली होती.कोण्या जिगरबाज गावकर्‍याने ते अवघड कड्यापाशी मातीत पुरुन ठेवली आणि जमीनीवर असलेल्या तोफेच्या नळीला त्याने घट्ट दोरखंड बांधून गड चढण्याची सोय केली.याचा उपयोग करुन रहाळातील गावकरी गडावर ये-जा करु लागले.अर्थात पुढे हे ही गैरसोयीचे झाले.त्यामुळे कोणा वनाधिकार्‍याने या पायर्‍यांच्या बाजुला रेलिंग बसवून आधार दिला आणि जीवघेण्या कसरतीतून सुटका केली.आजही हिच तोफ आपण पाहु शकतो.कालौघात रेलिंग मात्र नवीन आणि अधिक सुरक्षित बसविले आहे.
आता या तोफेची स्थापना एका गाड्यावर केली आहे.

20180211_111642



     अवघड असा टप्पा ओलांडून गेलो आणि लगेच प्रशस्त अश्या मोठ्या पायऱ्या लागतात. अत्यंत विचारपूर्वक खोदलेल्या त्या पायऱ्या आपल्याला थेट प्रवेशद्वाराशीच नेऊन ठेवतात. १० फुट लांबीच्या व दिड फुट ऊंचीच्या दमछाक करायला लावणा-या ५०-६० कोरीव व बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाची तटबंदी समोर येते. उभ्या कडय़ातील ही वाट चारी बाजूंनी ताशीव कडे असल्याने एका नाळेतून खोदुन काढली आहे. गडाचा हा प्रवेशमार्ग व हडसर,जीवधन गडाचा प्रवेशमार्ग यात असलेली समानता पहाता हे तीनही किल्ले सातवाहन कालखंडात एकाच राजवटीत बांधल्याचे जाणवते.

20180211_112221
दरवाज्याला हल्लीचे हे आधार लावलेले आहेत.


 गडाचा दरवाजा तटबंदीत पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेला असुन वाटेच्या उजव्या बाजुस दरवाजाच्या रक्षणासाठी बुरूज बांधलेला आहे. त्यामुळे खालून वा पायऱ्या चढून वर आलो तरी गडाचा दरवाजा दिसत नाही. गडाचा दरवाजा दक्षिणाभिमुख असुन कमकुवत झालेल्या या दरवाजाला लोखंडी खांबांचा आधार देण्यात आला आहे. 



दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड तासलेला कातळ असुन त्यावर एक तसेच दरवाजाच्या दगडी कमानीवर एक असे दोन गणपती कोरलेले आहेत. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा.

द॑रवाज्याच्या वर दिसणारी तटबंदी

दरवाजाच्या वरील बाजुस मारगीरीसाठी असलेल्या जंग्या तसेच दरवाजा समोरील भागात लक्ष ठेवण्यासाठी झरोका दिसुन येतो.
 दरवाज्यावरील गणेशला वंदन करून किल्ल्यात प्रवेश केला असता काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.गडावर जाण्यास पायथया पासून १.३० तास लागतो. 
चावंड गडाचा माथा
किल्ल्याच्या प्रवेशव्दारातून दहा पायर्‍या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्‌ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. चावंड किल्ला समुद्र सपाटीपासून ३५०० फूट उंचावर असुन ८५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला आहे. किल्ल्यावर आजही सहा बुरुज शिल्लक असून किल्ल्याची तटबंदी बांधताना कातळात चर खोदून त्यावर तटबंदी बांधली आहे.
          उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५ - २० पायर्‍या चढून गेल्यावर, काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला जवळ जवळ १५ ते २० वास्तूंचे अवषेश दिसतात. त्यात गडाची सदर व वाड्याचे अवशेष दिसुन येतात. यातील काही वास्तूंच्या भिंती,जोते व दरवाजाची चौकट आजही शिल्लक आहे.

 वाटेच्या उजव्या बाजुला एका वास्तुच्या चौथऱ्याजवळ पायऱ्या असलेली पाण्याची जोडटाकी असुन तेथे पाणी भरण्यासाठी दगडी ढोणी दिसुन येतात.





गडावर असलेले प्राचीन काळातील शौच्छालय


 वाटेच्या डाव्या बाजुला असलेल्या एका वाडयाच्या आत एक दगडी शौचकुप असुन या वाडयाच्या खालील बाजुस अलिप्त असे दुसरे दगडी शौचकुप दिसुन येते.
 बाजूलाच २ संलग्न अशी टाकी आहेत.हे सर्व पाहुन सर्वप्रथम गडाच्या बालेकिल्ल्याकडे निघावे. गडाचे आकारमान व गडावर असणारी पाण्याची २९ टाकी पहाता गड नांदता असताना गडावर खुप मोठया प्रमाणात वस्ती असावी. आजुबाजुच्या परीसराचा मुलकी कारभार या गडावरुन चालत असावा.
20180211_123025





20180211_121500
हे मंदिर इतक्यात बांधलेले असावे.
20180211_122625
 
पुढे वाट टेकडीवर असलेल्या चामुंडा देवीच्या मंदिराकडे जाते. बालेकिल्ल्यावर गडदेवता चामुंडा देवीचे नव्याने बांधलेले लहानसे मंदीर आहे.मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे.  चामुंडा देवीचे पूर्वाभिमुख मंदीर असून देवीची मूर्ती शेंदुर लावलेली आहे.
 चामुंडा देवी प्रामुख्याने राजस्थान, बिहार या प्रदेशात आढळते. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड ध्वजावर अग्नीपुराणाप्रमाणे चार हात शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे.
आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते, जी एखाद्या ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी .
20180211_121449


20180217_135658
 भगवा ध्वज इथे डौलाने फडकत असतो.

जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.

माणिकडोह धर्ण उर्फ शहाजी सागर तलावाचे दृष्य
गडमाथ्यावरुन जीवधन परिसरातील भटोबा, नवरा-नवरी सुळक्यांची रांग दिसते

 मंदिराच्या आवारात उभे राहिले असता माचीवरील सर्व अवशेष नजरेस पडतात व आपल्याला नक्की कुठेकुठे फिरायचे आहे याची कल्पना येते. येथुन दुरवर नजर फिरवली असता भटोबा, नवरा-नवरी सुळके, माणिकडोह व कुकडी जलाशय तसेच शिवनेरी, जिवधन निमगिरी, हडसर, सिंदोळा व जुन्नर तालुक्यात पसरलेल्या सह्याद्री रांगांचे दर्शन घडते.
20180211_113156
 गडाच्या याच भागात बर्‍यापैकी तटबंदी असून, आग्नेय भाग कड्यांनी व्यापला आहे. ज्या भागात तटबंदी आहे, त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. 
20180211_115210
बालेकिल्ल्यावरून खाली उतरून मूळ वाटेवर आल्यावर डाव्या बाजुने बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा मारायला सुरवात करावी. या वाटेवरून फिरताना कोणतेही अवशेष नसुन पाण्याची एकुण अठरा टाकी नजरेस पडतात. बेलाग कड्यांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या किमीच्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात

बालेकिल्ल्याची साधारण ८० टक्के प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर जेथुन सुरवात केली त्या वाटेच्या थोडेसे अलीकडेच एक खचत चाललेले भग्न शिवमंदीर व त्यासमोर असलेली पुष्कर्णी नजरेस पडते. या प्राचीन शिवमंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारपट्टिकेचा खालील भाग काही प्रमाणात शिल्लक असुन गर्भगृहासमोरच्या सभामंडपाची केवळ कमान कशीबशी तग धरून उभी आहे.कमानीखाली मंदिराच्या बांधकामातील कोरीव दगड पडलेला आहे. 

नंदी


शिवलिंग


मंदिरासमोरच एक डोकं नसलेला नंदी आहे त्यावरून हे महादेव मंदिर ओळखता येते.

20180211_123252

– –







20180211_123345

गर्भगृहाच्या मागील बाजुस एक कातळात खोदलेले जोडटाके असुन पुढील भागात असलेल्या बांधीव पुष्कर्णीला काही पायऱ्या व चौदा कोनाडे आहेत. यातील तीन चार कोनाड्यात भग्न मुर्ती असुन उर्वरीत कोनाडे रिकामे आहेत. मंदिरासमोर पुष्करणीच्या बाजुला एक भग्न नंदी आहे. हरिश्चंद्रगडावरील पुष्कर्णी व हि पुष्कर्णी काही प्रमाणात सारखीच आहे. तसेच रतनगड व निमगिरी गावतही अशीच पुष्करणी आहे.इ.स. ७५०च्या आसपास शिलाहार राजांनी हे मंदिर बांधले असावे. 


मंदिराची पूर्ण पडझड झाली असली तरी आजूबाजूस पडलेले अवशेष व दगडावरील नक्षीकाम आपल्याला काही काळ थांबवुन ठेवतात.
शिवमंदिराकडून एक वाट उजवीकडे गडाच्या उतारावर जाताना दिसते.येथून म्हणजे महादेव मंदिरापासून खाली गेले की गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत, ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. (सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ - देवी भागवत) या वाटेवर दगडांचा गोलाकार रचलेला ढीग दिसुन येतो. साततळी खोदताना निघालेला दगड येथे बांधकामासाठी रचुन ठेवला असावा. हि अशीच एकत्र टाकी अलंगगड व कुलंगगड येथेही पहायला मिळतात.

या ढिगाच्या मागील बाजुस एका विस्तीर्ण खडकात गोलाकार रचनेत एकाला लागून एक अशी सात तळी इथे खोदलेली आहेत. किल्ल्यावर जाऊन हे तलाव अजिबात चुकवू नये असे आहेत. एकाला एक जोडून असे सात तलाव असून पहिल्याच्या सुरवातीस प्रवेशद्वार आहे. त्यावरही मस्त असा गणपती कोरलेला आहे. थोडे वरून पाहिल्यास केवळ २ टाकी आहेत असे वाटते. या सात टाक्यांमुळे वर्षभर किल्ल्यावर पाण्याची अजिबात टंचाई होत नसावी. यातले पाणी बरेच चांगले आहे. पिण्यासाठी वापरण्याजोगे आहे.
या तळ्यात उतरण्यासाठी पश्चिम दिशेला पायऱ्या असुन या पायऱ्यांच्या शेवटी कातळातच एक दरवाजा कोरलेला आहे. या दरवाजाच्या कमानीत गणपती कोरला असुन कमानीच्या दोन्ही बाजुला लाकडी दरवाजा बसवण्यासाठी दगडी खाचा आहेत. प्रवेशद्वाराला हडसर किल्ल्याच्या प्रवेशद्वारा सारखीच नक्षीकाम केले आहे. एक मात्र जाणवते की, जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराची ठेवण आणि स्थापत्यकला सारखीच आहे.

गडाच्या या भागात बऱ्यापैकी तटबंदी असून तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. येथे आजूबाजूच्या परिसरात ६-७ उद्‌ध्वस्त बांधकामे तशीच डोंगर उतारावर पाण्याची ५ टाकी दिसुन येतात. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे तिथे घडीव दगड रचून ठेवले आहेत. तळ्याच्या उजव्या बाजुला जिथे तटबंदी संपते तेथुन एक वाट तटबंदीखाली उतरताना दिसते. 



यादवकालिन गुफांचा समुह (लेण्या)




या ठिकाणी कातळात कोरलेल्या १५ पायऱ्या असुन त्याखालील भागात ४ कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्याच्या चौक्या अथवा दारूगोळ्याचे कोठार असावे असे वाटते. येथील गुहा सुस्थितीत असुन एका गुहेत दोन बाजुला ५ फूट खोलीचे दोन हौद आहेत. गडावर रहाण्याची वेळ आल्यास या कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात.या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्थ सांगतात, येथे रॅपलिंग करून जाता येते.
        हे भुयार मी स्वतः काही पाहिलेले नाही.मात्र जुन्नरला राहणारे श्री रमेश खरमाळे हे माजी सैनिक असून त्यांनी प्रत्यक्ष या भुयाराचा मागोवा घेतला आहे.आपण या मोहिमेचा थरार जाणून घेउया त्यांच्याच शब्दात. 
   एक शोध किल्ले चावंडच्या नवीन भुयाराचा.
मित्रांनो गडकोट, सह्याद्री व निसर्ग भटकंती हे आता तर नियमितचेच सोबती झाले आहेत. त्यात गडकोट म्हणजे प्रत्येक वेळी नवनवीन अविष्कार दाखवणारा जादूगारच आहे असे वाटते. कारण खुप काही शिकायला व अनुभवायला येथे गेल्यावर मिळाले. परंतु यासाठी आपणाकडे वेळ असायला हवा. जुन्नर तालुक्यातील असलेल्या सात किल्यांवर जवळपास चार वर्षे अनेक वेळा निरीक्षणे करण्याची संधी मिळाली व त्याबाबतीत लिहिण्याचा व मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या दृष्टिकोणातून केला. यावर अनेक वाचक मित्रांनी चांगल्या प्रतीक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून नोंदविल्याने एक प्रकारे मला आपण प्रोत्साहीत करून पुन्हा पुन्हा लिहिण्यासाठी निश्चितच बळ दिले. वाचक मित्रांनो आपल्याच माध्यमातून अनेक विविध पैलूंवर मला अभ्यास करण्याचा व जोपासण्याचा छंद जडला. आता कालचेच उदाहरण द्यायचे झाले तर संध्याकाळी 4:30 वाजता एक व्यक्ति घरी आली. भटकंती बाबत अनेक विषयावर चर्चा झाली. याच चर्चेत एक विषय निघाला किल्ले चावंडच्या बाबतीत. चावंडवर तसा मी अनेक वेळा गेलो व त्यावर वेळोवेळी लिहिले पण परंतु विषय होता तो किल्ले चावंडवर असलेल्या भुयाराबाबत. दोन वेळा येथे जाण्याचा योग पण आला परंतु या भुयारात पाणी असल्याने हे नक्की काय असेल हे सांगणे कठीण होते. आमच्या गप्पा चालू होत्या. संध्याकाळचे रमेश बरोबर गप्पा मारत मारत 5:30 कधी झाले समजलेच नाही. रमेशला सहज प्रश्न केला जाऊयात का आता चावंडला भुयारात शिरण्यासाठी? तो पण हो म्हटला. मग काय? वेळ, काळ याकडे आम्ही थोडेच लक्ष देणार होतो. दूचाकी घेऊन आम्ही निघालो चावंडच्या दिशेने. आकाशात पावसाच्या ढगांनी खुप गर्दी केली होती. कुठल्याही क्षणी मेघराज्याचे आगमन होणार होते. मेघराज्या कितपत साथ देईल सांगणे कठीण होते. 30 मिनिटांत किल्ले चावंडच्या उत्तर पायथ्याशी पोहचलो. हलकी बुंदाबांदी सुरू झाली होती. आम्ही छायाचित्रे व चित्रांकण करत झपझप किल्ला सर करू लागलो. अर्धा किल्ला सर करून कच्या पाऊलवाटेने पश्चिमेकडे धाव घेतली. कारण आता मेघराजाणे कोपण्यास सुरूवात केली होती. भीती होती ती फक्त वरून पावसामुळे स्लाईड होणाऱ्या दगडधोंड्यांची. (मित्रांनो येथे निश्चितच सांगू इच्छितो की प्रथम चांगला पाऊस सुरू झाला की सह्याद्रीची भटकंती किमान 15 ते 20 दिवस तरी थांबवावी, कारण या कालावधीत कडे कोसळण्याचा जास्तीत जास्त खतरा असतो.) झपझप पावले उचलत या भुयाराच्या निवा-याला आम्ही सुरक्षित पोहचलो. आता कितीही पाऊस झाला तरी आम्हाला कसलीच भीती नव्हती, की वरून कडा कोसळला तरी ते भुयार गाडण्याची भीती नव्हती.

बाहेर पाऊस पडत होता व आमचा भुयारात घुसण्याचा खेळ सुरू होता. साधारण 4×3 फुट उंची,रूंदी असलेल्या या भुयारात प्रवेश बसुन सरकत सुरू झाला. विजेरी सोबतच होती. आतमध्ये किती लांबवर जावे लागणार हे साधारण 25 फुट आतमध्ये गेल्यावर समजणार होते, कारण या ठिकाणाहून उजवीकडे भुयार कोरले गेले होते. जुन्नर तालुक्यातील आकरा भुयारांचे निरीक्षण पाहता हे भुयार व त्याची रचना वेगळीच दिसत होती. कारण अडीच अडीच फुटावर प्रथमतः तीन स्टेप व नंतर पुढे सपाट भाग दिसत होता.


 आम्ही काळजीपुर्वक पुढे सरकत होतो. भिंतीवर वेगळ्या प्रजातीची पाल निदर्शनास पडली होती. आम्ही पुढे जसजसे सरकत होतो ती पण पुढे पुढे सरकत आम्हाला रस्ता दाखवत होती. तुडुंब पाण्याने भरलेले हे भुयार कोरडे झाले होते.

विजेरीचा लांबवर केलेल्या प्रकाशात अचानकच एक ठिकाणी काहीतरी चमकत होते. काय असावे सांगणे कठीण. पुढे भयानक शांतता व गडद अंधार होता. पाठीमागून भुयाराच्या तोंडातून पडणा-या उजेडानेपण आता आमची साथ सोडली होती. गरमीच्या उकाड्याने शरीरातून घामाच्या धारा फुटू लागल्या होत्या. भुयाराच्या उजव्या वळणावर आम्ही थोडी विश्रांती म्हणुन थांबलो होतो. भुयाराचा आकार थोडा कमी झाला होता. आत मध्ये फक्त शिरताना एवढा त्रास होत होता तर हे कोरताना कोरणाराचे काय झाले असेल? त्याने कोणत्या उजेडात हे कोरले असेल? आता तर माझ्याकडे विजेरी आहे त्यावेळी भुयारात प्रदुषण होऊ नये म्हणून काय असेल? हे कोरताना उजेडासाठी व कोरण्यासाठी काय वापरले असेल? हे नक्की माणसानेच कोरले असेल का? जर माणसाने कोरले असेल तर ऑक्सिजनची आतमध्ये तरतुद असेल का? असे विविध प्रश्न या दोन मिनिटांच्या विश्रांतीत काहूर माजून गेले. पुढे काय आहे हे पाहण्याची उत्सुकता लागली होती. रमेश आणि मी काळजी घेत पुढे सरकत होतो.
आता तर पुढे आणि पाठीमागे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या काळोखात फक्त आणि फक्त आमच्या घेत व सोडत असलेल्या श्वास व उश्चवासाचाच आवाज येत होता. सरकताना होणारा आवाज छातीतून निघणा-या ठोक्यांच्या आवाजाशी जणू स्पर्धा करत आहे की काय असे वाटत होते. विजेरीत चमकणारे ती वस्तु जवळच होती. ती खुप सुरेख व सुंदर होती. ती मी आज प्रथमतःच या आकारात पाहत होतो. 
कदाचीत ही नवीन संशोधनाचा भाग असू शकेल असे वाटत होते. ही वस्तू म्हणजे एक बेडूक नावाचा जीव होता. त्याचा एक डोळा चमकताना दिसत होता. जवळ जाताच त्याने उडी मारली असे अनेक बेडूक आमच्या आगमनाची वाट पाहत होते. भुयारात ओलावा सुरु झाला होता. पुढे भुयाराचा तोंड बंद होते परंतु उजव्या व डाव्या बाजूला पुन्हा मार्ग कोरलेले होते. साधारण आम्ही 40 ते 45 फुट आतमध्ये होतो. उजव्या व डाव्या बाजूला हे भुयार जेथे वळण घेते त्या ठिकाणी मी सरकत सरकत पोहचलो होतो. दोन्ही बाजूंनी हा मार्ग पाण्याने तुडुंब भरलेला दिसत होता. आमचा प्रवास येथेच संपणार होता. येथून माघार घ्यावी लागणार होती ती पुढल्या वर्षी पुन्हा येथे एकदा येण्यासाठी व पुढील संशोधनासाठी.
आम्ही माघारी फिरलो होतो. एक रमेश दुसर्‍या रमेशला विचारत होता सर हे नक्की काय असेल ओ?
सोबत असलेल्या रमेशला सरकताना होणा-या त्रासापेक्षा उत्सुकतेची जास्त ओढ दिसून येत होती. तो पण कमालीचा भटक्या बहाद्दर गेली 15 वर्ष याच सह्याद्रीच्या कुशीत फिरतोय. मला तर येथे भटकंती करताना फक्त पाच वर्षे झाली परंतु या बहाद्दराने तर चालून चालून सह्याद्रीची चाळणच केलीय असे तो सांगतो.
मी म्हटलं बाहेर पडल्यावर तुला सांगतो. परतीचा भुयारातील प्रवास दहा मिनिटांतच उरकला. वरूणराजा येथील निसर्गाची भेट घेऊन निघून गेला होता. आम्ही सुरक्षित बाहेर पडलो होतो. चालता चालता मी रमेशला सांगू लागलो. हा भुयारी मार्ग सध्यातरी पाण्यासाठी कोरण्यात आला असावा असे वाटते. कारण त्यावेळी तीन गोष्टींना प्राधान्य दिले जायचे. अन्न, पाणी व निवारा. यामध्ये सर्वात महत्वाचे असे ते पाणी व स्वसुरक्षितता. जंगली श्वापदांपासून बचाव करायचा असेल तर मनुष्य डोंगर भागात अशी ठिकाणे शोधायचा की त्या ठिकाणी या वरील तीन गोष्टी सहज मिळविणे शक्य असे. भरपूर वाढलेल्या जंगलात कंदमुळे तर मोठ्या प्रमाणावर भेटून भुक भागविली जायची परंतु उन्हाळ्यात पाणी मिळावे म्हणून भटकंती सुरू व्हायची व श्वापदांपासून मनुष्याची शिकार व्हायची, त्यामुळे अशी सुरक्षितता जेथे असेल त्याठिकाणी नंतर पाण्याच्या टाक्या खोदण्यात आल्या असाव्यात. नंतरच्या काळात शत्रुं पासून किल्यांवर असलेल्या पाणी साठ्यावर विषप्रयोग केला जात असे व पाणी सप्लाय बंद केली जात असे त्यावेळी या गुप्त पाणी साठ्यांचा वापर करून किल्ले अबाधित ठेवण्यास मदत मिळत असे, की पिण्याच्या पाण्याची गरज अगदी भर उन्हाळ्यात सुद्धा पुर्ण होत असे. पुन्हा पाणी आटल्यावर या भुयाराच्या इतिहासाला कलाटणी मिळेल का? हा प्रश्न भेडसावू लागला.
अंधार पडू लागला होता. अनेक शंका कुशंका मनात घेऊन आमचा परतीचा प्रवास दुचाकीवरून जुन्नरच्या दिशेने गड उतार होऊन सुरु झाला होता.

मित्रांनो या भुयारातील थरार पाहण्यासाठी आमचा YouTube channel “Nisargramya Junnar Taluka” subscribe करायला विसरु नका.
YouTube channel लिंक – https://goo.gl/3usx1G

लेख व छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण

माजी सैनिक 

   एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५ – ६ किमीचा परीघ असावा. गडाच्या इशान्येस असणार्‍या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बर्‍याच दंतकथा प्रचलित आहेत. पायथ्यापासुन संपुर्ण किल्ला फिरण्यास ५ तास लागतात.
अजून काही :
१. चावंड आणि हडसर किल्ला पण एका दिवसात होतो. चावंड गावातून बोटीने माणिकडोह धरणातून पलीकडे जाता येते.
२. हडसर किल्ल्याच्या बाजूस, राजूर पासून थोड्या अंतरावर वाघ्र प्रकल्प आहे. माणिकडोह परिसरात सापडलेले वाघ, बिबटे पकडून येथे ठेवले जातात. सध्या तेथे तब्बल २८ वाघ आहेत.
३. कुकडेश्वर मंदिरापासून पुढे डोंगर चढून गेल्यास आपण डायरेक्ट दाऱ्या घाटात पोहोचतो. तेथूनच दुर्ग ढाकोबा ला हि जाऊ शकतो.
४. ५ दिवस हाताशी असतील तर माणिकडोह ला प्रदक्षिणा मारता येते.
 जुन्नर ->चावंड -> कुकडेश्वर -> जीवधन -> नानाचा अंगठा -> नाणेघाट -> निमगिरी -> हडसर -> माणिकडोह  वाघ्र प्रकल्प-> शिवनेरी ->जुन्नर

संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
३) गुलशने ईब्राहिमी- फेरीश्ता
४) बुर्हाने मासीर-
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
६) साद सह्याद्रीची !  भटकंती किल्ल्यांची !!- प्र.के.घाणेकर
७) पर्णालपर्वतग्रहणाख्यान- जयराम पिंड्ये
८) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
९)  www.durgbharari.in  हि वेबसाईट
१०) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
११) http://sagarshivade07.blogspot.com/2013/12/blog-post.html हा ब्लॉग
१२) http://www.nisargramyajunnar.in/chawand-bhuyar/ - श्री रमेश खरमाळे
१३) हडसर-निमगिरी-चावंड-जीवधन-नाणेघाट - महेश तेंडुलकर


 
   

Chawand

16
September 24, 2018
Written by MADHYALOK

“Chawand” also known as “Prassannagad” is a famous fort from Junnar region of Pune district. Junnar ragion also houses strong forts like Shivneri, Jeevdhan, Hadsar, Nimgiri (Read the blog here), Sindola (Read the blog here), and Narayangad (Read the blog here).

Chawand is a fort with lots of history and great geographical location. The fort is located at just around 13km from Junnar city which hosts “Shivneri fort, birth place of Shivaji Maharaj. The fort is also at around 13km famous ancient trade route of “Naneghat”. Fort’s geographical location provides an advantage to this fort. One can see stalwart forts like Hadsar, Nimgiri, Naneghat range, Ajoba, Shivneri from here. Forts like Siddhagad, Ghorakhgad, bhorgiri are also nearby in radius of less than 50km. This beautiful fort was on my wish list from many days. Let me take you to a photo journey of this charming fort with magnificent views.

Amazing view From Fort Chawand
Amazing view from “Fort Chawand”

The permutation and combination of Ruchira having a holiday and me also having a holiday on same day and this day falling on a weekday is rare these days. This year’s Ganesh Chaturthi provided us this chance. We decided to encash this rare opportunity and decided to trek this enchanting and energetic fort. A plan was made and call to several friends were made. But seeing the day of festival everyone nodded in negative response except Amit and Sanjay. With a gang of 4 people we were all set for a day trek.

On the morning of 13th Sep we left our homes in search of tranquility away from hustle bustle of city and urbanization and Chawand did not prove our decision wrong.

Sanjay taking a look at vast expanse of Sahyadri mountain range
Sanjay taking a look at vast expanse of Sahyadri mountain range

As we progressed towards the fort the sky was getting ready to show us some amazing color display in the later part of the day. We reached at base village Chawand and we began ascending the fort.

Chawand Fort as seen from base
Chawand fort as seen from base

The hike is pretty simple and straight forward. The climb route has stairs from start till end. The initial steps are reconstructed and are firm. In the middle part there are some exposed patches of flights but these are now taken care by putting a big railing on the exposed side and also a guide wire is placed on the rock side to hold making the route safe. And the last flight of the staircase is of old steps. These old steps have risers (the vertical portion of a step) as big as approx. 2 feet or knee high.

Stairs
Top – Old stairs with newly put railing,  Bottom – Reconstructed stairs

 

Topmost section of staircase which leads to "Ganesh Darwaja", also rampart can be seen in the photo
Topmost section of staircase with big risers which leads to “Ganesh Darwaja”, also rampart can be seen in the photo

 

Narrow and exposed steps but now railing have made the climb safe
Narrow and exposed steps (with railing on left guide wire on right)

At one flight of the stairs a old cannon is places in the midway.

An old cannon placed on the staircase
An old cannon placed on the staircase
Ruchira and Sanjay climbing the stairs
Ruchira and Sanjay climbing the stairs

 

View of surrounding ranges as seen from stairs
View of surrounding ranges as seen from stairs

 

Strong rampart of the fort
Strong rampart of the fort

This staircase leads us to the entrance of the fort, the “Ganesh Darwaja”.

Ganesh Darwaja
Ganesh Darwaja

One can see a “Ganesh” statue carved on the top of this door, hence the name. At the base of door one can also see a provision of passage for drainage of rain water so that water coming from top of the hill will not get blocked and also the water will not damage wooden door then fixed in the stone frame.

It was now time for a group photo
It was now time for a group photo

In the above photo, on the left side of the door a square long channel is cut through stone again for the same provision.

Top - Water channel cut through rocks Bottom - Zoomed photo of the channel
Top – Water channel cut through rocks       Bottom – Zoomed photo of the channel

The door is very big and also has a good porch in front. The side walls of rock chiseled to make a climb on the rampart from this location difficult.

Manmade Rampart and chiseled rock wall with Ganesh Idol
Man made rampart and chiseled rock wall with Ganesh idol

After crossing this door one comes at the main plateau of the fort.

View from plateau and remains of structure at distance
View from plateau and remains of structure at distance

Here several remains of plinths of old mansion or offices can be seen. As the rains has just dwindled the fort was covered in lush green grass and dense shrubs making it difficult for us to wade and trace the paths. But thanks to monsoon trekkers one trail was still prominent. We took this trail. The trail lead us to “Y” type junction. We took the left branch of this “Y”. This path lead us to the first big water tanks on the fort.

Big water tank
Big water tank

This tank was completely filled with water and still few springs were contributing to its collection making it overflow. This tank is adjacent to old fallen Shiva temple, only few stone from base and the arch of door is in place.

Ancient Shiva temple and its beautiful arch
Ancient Shiva temple and its beautiful arch

This temple also has another tank ahead of it. The tank is called as “Pushkarni”.

Pushkarni (The sacred tank)
Pushkarni (The sacred tank)

 

Old broken statue of Nandi (The Bull)
Old broken statue of Nandi (The Bull) was lying just next to Pushkarni

 

Pushkarni and Shiva Temple
Pushkarni and Shiva Temple

The trail from here took left and went towards North – East side of the fort. Tall grass and dense bushes again made it difficult for us to walk and identify any prominent structure in the area.

Tall grass, remains of old structure and the grandeur of magic called "Sahyadri"
Tall grass, remains of old structure and the grandeur of magic called “Sahyadri”

 

Magic Of Sahyadri
Magic Of Sahyadri

 

Wild flowers (Sonaki i.e Adenoon indicum) at bloom
Wild flowers (Sonaki i.e Adenoon indicum) at bloom

 

Wild Flowers
Wild Flowers

As we came closer to the edge of the fort we again saw some remains of the plinth. There were few old rusted out metal board in the vicinity we wondered why are they here. Sanjay was more puzzled on the placement of these boards and asked the question of why they are here. But we could not find the answer. We took a water break here and returned to the Mahadeva temple.

View of Fort Hadsar and Fort Nimgiri from from Northern edge of Fort Chawand
View of Fort Hadsar and Fort Nimgiri from from northern edge of Fort Chawand

 

Meanwhile it looked like sky was gearing up for some big torrential rains
Meanwhile it looked like sky was gearing up for some big torrential rains

Here we decided to take a round tour of the fort and explore all sides and views.

Ruchira in exploration mode
Ruchira in exploration mode

To our surprise we saw many water tanks on the on the trail. The number could be as big as 10 scattered all around the fort.

Some of the several water tanks on the fort
Some of the several water tanks on the fort

 

One of the water tank had this submerged colony of plants
One of the water tank had this submerged colony of plants

 

Dragonfly
Dragonfly

As our round tour ended we came to “Y” junction. This time we took the right branch of Y. While climbing this path we got the answer of why the metal boards were placed at those particular location. Eureka!!! We could see the forts most fascinating architecture “The Saptamartuka tanks” just few feet away from the boards.

This path took us to summit of the fort which houses the temple of deity “Chamunda”.

Temple of Goddess "Chamunda"
Temple of Goddess “Chamunda”

 

Not sure on exact purpose of this but looked like a "Light tower" or "Deepmal"
Not sure on exact purpose of this but looked like a “Light tower” or “Deepmal”

Temple is small and has a statue of Goddess.

Goddess Chamunda
Goddess Chamunda

The summit provided us the great views of surroundings and amazing site of Manikdoh dam. After a short break we started descend from summit and now progressed towards the “Saptamatruka tanks”. There are 7 interconnected tanks in a big circular shape.

Saptamatruka Tank
Saptamatruka Tank

These 7 tanks depicts 7 divine mother (matruka) goddess namely Brahmani, Vaishanvi, Maheshwari, Indrani, Kaumari, Varahi and Chamunda.

Entrance door to Spatamartuka tank with a beautiful Ganesh statue at the top of door arch
Entrance door to Spatamartuka tank with a beautiful Ganesh statue at the top of door arch
Amit found this place's best use in modern times by meditating
Amit found this place’s best use in modern times by meditating

 

Our group at Saptramatruka Tank
Our group at Saptramatruka Tank

 

Sanjay taking a stroll on tank's wall
Sanjay taking a stroll on tank’s wall

 

It was my turn to pose
It was my turn to pose

 

Let's connect with "Nature"
Let’s connect with “Nature”

After a short photographic session we left this fabulous architectural marvel.

Ruchira having the look at irresistible skyscapes
Ruchira having the look at irresistible skyscapes

 

As usual before coming to this hike we had gathered information about fort and as per the information we had we were now left with visiting the caves of the fort. And as another regular practice of carrying an information book with us while on trek, this time we had Bhagwan Chile sir’s book. The book mentioned that caves are just ahead of this tanks towards north.

A small path steered us to caves.

Rock cut steps going towards cave
Rock cut steps going towards cave

 

There are three big chambers or caves each with a different purpose. The extreme last must have served as “Arsenal” while middle one for storage of goods or foods and the first one for stay.

"Arsenal" chamber of the three cave complex
“Arsenal” chamber of the three cave complex
Pit with provision for cover
Pit with provision for cover

The arsenal type cave had a pit with a provision of covers. Several post holes on the ground as well as in the wall so that a scaffolding can be constructed and weapons, arms could be placed on it. This cave is relatively in much better shape and has least affected by actions of vandalism.

Inside view of Arsenal chamber, post holes on ground and wall can be seen here
Inside view of Arsenal chamber, post holes on ground and wall can be seen here
The central chamber - It is the biggest of all three
The central chamber – It is the biggest of all three

 

 

Third chamber - It is the smallest of all three
Third chamber – It is the smallest of all three
Rampart near cave
Rampart near cave

 

The mountain couple
The mountain couple

 

We spend a quite good amount of time here and also had a small photography session.

Having covered all the major part of fort it was now time for us to start return journey. While it took us at round 40 min to climb the fort we descended in just 20 mins (No we were not fast, but simply because we did not clicked any pictures as we did while going up). At the base village we got ourselves refreshed at nearby hand pump.

 

We still had ample time and big part of day in hand. We decided to take a short reccie tour of Manikdoh dam and an island which was formed temporarily due to inflow of water.




Temporarily formed island due to inflow of water
Temporarily formed island due to inflow of water

History of the fort:- In 1486 Chavand was among the Poona forts which fell to Malik Ahmad the founder of the Ahmadnagar Nizam Shahi family. [Briggs’ Ferishta, III. 190.] In 1594 Bahadur the infant son of Burhan Nizam II. (1590-1594) was confined in Chavand for over a year and was then raised to the Ahmadnagar throne. [Briggs’ Ferishta, III. 304.] In 1637 Jund or Chavand appears among the Poona forts which Shahaji gave to the Moghals. [Elliot and Dowgon, VII. 60; Grant Duff’s Marathas, 53.] In the Maratha war of 1818 a British brigade was sent to take Chavand. The brigade encamped before; Chavand on the 1st of May 1818 and demanded its surrender. The commandant refused to surrender unless directed by his master. A fire of mortars and howitzers was begun in the evening and the bombardment continued till next morning during which about a hundred shells were fired. Then the garrison of upwards of 150 Marathas surrendered unconditionally. They were disarmed and dismissed to their villages. <a href="Source: https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Poona%20District/places_c.html#.”>Pendharid Maratha War Papers, 294.

GPS Map of Chawand Fort Hike
GPS Map of Chawand Fort Hike
Elevation Profile Of Fort Chawand
Elevation Profile Of Fort Chawand

 

Strava Map: https://www.strava.com/activities/1838614681

Fort Location on GPS: https://goo.gl/maps/XLZLmTgVjFR2

Co-ordinates: 19°14’13.5″N 73°44’56.5″E

Distance: 135km (to and fro Pune)

Travel Mode: Car

Trek Mates:  Sanjay Shelke, Amit Jain, Ruchira and me

Route: Pune – Narayangaon – Junnar – Aptale – Chawand – Aptale – Junnar – Pune

Food: We carried snacks and fruits with us

Water: We carried water with us.

Places of Interest: Rock cut stairs, entrance door, ruins of old structure, ramparts, Pushkarni, several tanks, Saptamatruka tank, caves, Chamunda devi temple.





































सप्तमातृका 

      


 सैनिक


at May 16, 2022
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...

  • नाशिक (नासिक)
     नाशिक शहराची निर्मीती व ऐतिहासिक महत्त्व :-           नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर असून, त्याला ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक,...
  • चौल रेवदंडा माहिती ( अंतिम )
               सह्याद्रीमुळे समुदसपाटीची पश्चिम किनारपट्टी आणि उंचीवरचे पठार विभक्त झाले. पश्चिम किनारपट्टी कोकण म्हणून ओळखली जाउ लागली. तळकोकण,...
  • नाशिक शहरातील एतिहासिक ठिकाणे ( अंतिम )
    तपोवन   प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली नाशिक नगरी. ‘पश्चिम काशी’ म्हणून ओळख असलेल्या याच नाशिकमधील पंचवटी भागात तपोवन हे ठिक...

Search This Blog

Blog Archive

  • ►  2026 (61)
    • ►  August 2026 (8)
    • ►  July 2026 (4)
    • ►  June 2026 (9)
    • ►  May 2026 (3)
    • ►  April 2026 (23)
    • ►  March 2026 (6)
    • ►  February 2026 (4)
    • ►  January 2026 (4)
  • ►  2025 (83)
    • ►  December 2025 (8)
    • ►  November 2025 (10)
    • ►  October 2025 (3)
    • ►  September 2025 (2)
    • ►  August 2025 (5)
    • ►  July 2025 (14)
    • ►  June 2025 (1)
    • ►  May 2025 (5)
    • ►  April 2025 (18)
    • ►  March 2025 (9)
    • ►  February 2025 (2)
    • ►  January 2025 (6)
  • ►  2024 (126)
    • ►  December 2024 (2)
    • ►  November 2024 (6)
    • ►  October 2024 (8)
    • ►  September 2024 (8)
    • ►  August 2024 (10)
    • ►  July 2024 (11)
    • ►  June 2024 (22)
    • ►  May 2024 (10)
    • ►  April 2024 (7)
    • ►  March 2024 (14)
    • ►  February 2024 (11)
    • ►  January 2024 (17)
  • ►  2023 (199)
    • ►  December 2023 (10)
    • ►  November 2023 (27)
    • ►  October 2023 (11)
    • ►  September 2023 (5)
    • ►  August 2023 (4)
    • ►  July 2023 (15)
    • ►  June 2023 (21)
    • ►  May 2023 (31)
    • ►  April 2023 (13)
    • ►  March 2023 (57)
    • ►  February 2023 (2)
    • ►  January 2023 (3)
  • ▼  2022 (119)
    • ►  December 2022 (4)
    • ►  November 2022 (4)
    • ►  October 2022 (19)
    • ►  September 2022 (7)
    • ►  August 2022 (11)
    • ►  July 2022 (8)
    • ►  June 2022 (7)
    • ▼  May 2022 (19)
      • गणेश लेणी व शेजारील लेणी-समूह, जुन्नर
      • नारायणगड
      • अंबा अंबिका लेणी समूह
      • जीवधन
      • निमगिरी
      • दुर्ग, ढाकोबा (Durg, Dhakoba )
      • जुन्नर लेणी
      • भूतनाथ लेणी - धामणखोल
      • हडसर
      • चावंड
      • तुळजा लेणी
      • शिवनेरी
      • शिवनेरी किल्ल्यावरील अपरिचित लेणी
      • जुन्नर परिसर
      • उत्तर कर्नाटकातील सिद्दी समाज :
      • राजगुरुनगर
      • कोल्हापूर चा पोसायडन
      • भारतातील हजारो वर्षांपूर्वीची प्रसिद्ध प्राचीन मंद...
      • किल्ले भोरगिरी
    • ►  April 2022 (1)
    • ►  March 2022 (8)
    • ►  February 2022 (18)
    • ►  January 2022 (13)
  • ►  2021 (92)
    • ►  December 2021 (13)
    • ►  November 2021 (3)
    • ►  October 2021 (9)
    • ►  September 2021 (7)
    • ►  August 2021 (14)
    • ►  July 2021 (2)
    • ►  June 2021 (5)
    • ►  May 2021 (3)
    • ►  April 2021 (1)
    • ►  March 2021 (10)
    • ►  February 2021 (24)
    • ►  January 2021 (1)
  • ►  2020 (28)
    • ►  December 2020 (19)
    • ►  November 2020 (2)
    • ►  October 2020 (2)
    • ►  September 2020 (2)
    • ►  July 2020 (3)

Report Abuse

  • Home

About Me

माझे कच्चे लेखन
View my complete profile
Simple theme. Theme images by luoman. Powered by Blogger.