अंतरावर पाडळी गावाजवळील तुळजा टेकडीत खोदली आहेत. मध्ययुगात येथील लेणे क्र. ४ मध्ये तुळजाभवानीची मूर्ती स्थापन केल्याने या संपूर्ण टेकडीला ‘तुळजा टेकडी’ असे संबोधले जाऊ लागले.
तुळजा लेणी-समूह, जुन्नर.
जुन्नर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शहर. भारतातील एकून लेण्यांपैकी सर्वात जास्त लेणी जुन्नर तालुक्यात आहेत. त्या पैकीच तुळजा लेणी.दोन हजार वर्षापुर्वी सातवाहनांचे नगर म्हणजे जुन्नर उर्फ जीर्णनगर ! या भुमीत एक संस्कृतीने जन्म घेतला. सातवाहनांचा आश्रय आणि नाणेघाटातून चालणारा व्यापार यामुळे इ.स.पुर्व पहिले शतक ते इ.स. पहिले शतक या कालावधीत या परिसरात मोठ्या संख्येने लेण्यांची निर्मिती झाली. एखादी नदी एखाद्या प्रदेशात सुपिकता आणते तसे जुन्नर परिसरात नाणेघाटामुळे लोकजीवन्,जीवनशैली,भवताल, वापरातील वस्तु ,स्थापत्य या सार्यात बदल घडवला. यापैकीच एक म्हणजे या परिसरात झालेली लेण्यांची निर्मिती. सात लेणीगटात विभागलेली , तब्बल दोनशे लेणी ज्या डोंगरात आहेत किंवा देवता ज्या तिथे निवास करत आहेत्,त्यावरुन हे लेणीसमुह ओळखले जातात. तुळजा,लेण्याद्री,लेण्याद्री पुर्व, भीमाशंकर्,अंबा-अंबिका,भुतनाथ आणि शिवनेरी असे हे गट आहेत. महाराष्ट्रात जुन्नर येथे सर्वाधिक संख्येने लेणी आहेत. कलेच्या अंगाने विचार करता ती अजिंठा,वेरूळ इतकी श्रीमंत नसली तरी स्थापत्याच्या दृष्टीने अनोखी आहेत. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाचे धागेदोरे त्यामध्ये दडले आहेत.
तुळजा लेणे हे जुन्नर परिसरात खोदले गेलेले पहिले लेणे.लेण्याच्या पोटात असलेल्या तुळजा देवीच्या स्थानावरुन याला 'तुळजा लेणे' हे नाव मिळाले. काहीशा अप्रसिध्द परंतु सुंदर अशा तुळजा लेणी समूहाला भेट देण्यासाठी जुन्नर शहरातून सोमटवाडी-दर्या घाटाकडे जाणारा मार्ग पकडावा. शहरातील मुख्य चौकापासून थोडेसेच अंतर पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला वरसुबाई देवीचे छोटेसे मंदिर दिसते. इथून पुढे आपटाळेकडे जाणारा रस्त्याने मंदिरापासून डांबरी मार्गाने अजून थोडेसेच अंतर पुढे गेल्यावर उजव्याबाजूला एक कच्चा रस्ता दिसतो, त्या रस्त्याकडे वळावे. ह्या कच्च्या रस्त्याने सुमारे अडीच किमी सरळ गेल्यावर आपण थेट तुळजा लेणीच्या डोंगराच्या पायथ्याला येऊन पोहोचतो.जुन्नर ते तुळजा लेणी हे अंतर साडे तीन कि.मी.आहे.रस्ता कच्चा असला तरी पायथ्यापर्यंत वाहन आणता येते. इथे येताना डाव्या हाताला एतिहासिक पद्मावती तलाव दिसतो.निजामशाहीत बांधलेल्या या तलावात आजही पाणी आहे.कधीकाळी याच तलावातून जुन्नर शहराची पाणी पुरवठा योजना सुरु होती.आजही जुन्नर शहरात कोठे खोदकाम सुरु झाले कि याच्या पाणीयोजनेचे अवशेष मिळतात. खरतर या तलावाचे आणि जलवाहिनीचे अवशेष जपुन हा वारसा पुढे पोहचवायला हवा आहे..ज्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी किल्याच्या पश्चिम बाजुला कड़ेलोटाच्या पायथ्या जवळ एक टेकडी लागते त्या टेकडी पासुन जवळच ठाकरवाडी म्हणुन एक गाव आहे, त्या गावाच्या शेवटी तुळजा लेणी कोरलेली आपणास पहायला मिळते.पोहोचण्याचा मार्ग :-जुन्नर नवीन बस स्थानक – श्री शिवाजी महाराज पुतळा – सोमतवाडी रोड – सोमतवाडीचा डोंगर – तुळजा लेणीजुन्नर-आपटाळे रस्त्यावर उजव्या बाजुला असणाऱ्या पिंपळेश्वराच्या डोंगरात ह्या लेणी आहेत. ( ऊंची : ८६० मी. )
तुळजा लेणी पासून शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्म स्मारक आणि कडेलोटाची जागा अगदी सहज दृष्टिक्षेपास येते. शिवनेरी किल्ल्यावर अनेक पर्यटक आणि दुर्गप्रेमींची गर्दी नेहमीच असते मात्र किल्ल्यापासून अगदी जवळ असलेले हे सुंदर शिल्परत्न आजही हौशी पर्यटकांना फारसे माहित नाही. खरेतर तुळजा लेणीची पायथ्यापासून असलेली कमी उंची आणि सोपी चढण असल्यामुळे शिवनेरी किल्ल्यासोबत तुळजा लेणी असा एका दिवसाचा सहकुटुंब बेत आखणे सहज शक्य आहे.
चंद्रकोरीच्या आकारात वळालेल्या डोंगरात अगदी मध्यभागी हे लेण लपून बसलेले आहे,त्यामुळे अगदी जवळ जाईपर्यंत ते दिसत नाही., डोंगराच्या साधारण मध्यभागी असलेल्या आडव्या कातळावर कोरलेल्या लेण्याकडे पायथ्यापासून मळलेली सरळसोट पायवाट आपल्याला थेट लेणी समूहापर्यंत घेऊन जाते. लेणी समूहाची पायथ्यापासून जास्त उंची नसल्यामुळे केवळ ५-१० मिनिटांमध्ये आपण लेण्यांपाशी पोहोचतो. जिथून आपला लेणीसमूहापाशी प्रवेश होतो त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूस बऱ्याचवेळा मधमाशांची पोळी लगडलेली असतात आणि काही मधमाशा येथे घोंघावतही असतात. तरी लेणी समूह बघताना काळजी बाळगावी.
तुळजा लेणी समूहामध्ये एकूण १२ विहार, एक चैत्यगृह आणि दोन पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आढळतात. तुळजा लेणी समुहामधील चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तुपाची रचना आवर्जून पाहण्यासारखी आहे. महाराष्ट्रामध्ये असलेल्या लेणी समूहामध्ये जिथे स्तूप कोरलेला असतो तिथे स्तूपाच्या दोन्ही बाजूस समांतर असे स्तंभ कोरलेले आढळतात. मात्र येथील स्तूप ह्या रचनेला अपवाद आहे. इथे चैत्यगृहामध्ये कोरलेल्या स्तूपाच्या चहुबाजूने गोलाकारामध्ये स्तंभ कोरले आहेत. सुमारे ११ फूट उंचीचे एकूण बारा स्तंभ मुख्य स्तूपाच्या सभोवती कोरलेले दिसतात. लेणीस्थापत्यामध्ये महत्वाची असलेली चैत्यगृह चौकोनी किंवा लंबगोल आकारात असतात.
तुळजा लेण्यांचा नकाशा
इथे मात्र चैत्यगृह चक्क वर्तुळाकार आहे.या लेण्याच्या मध्यभागी २.५९ मी. व्यास व ३ मी. उंची असलेला साधा स्तूप आहे. स्तूपाचा खालील भाग (१.३२ मी. उंच) गोलाकार असून त्यावर ‘अंड’ (१.६७ मी. उंच) आहे. अंडावर हर्मिका तसेच चौरस खाच होती, ती आता नष्ट झालेली आहे.या लेणी मधे असलेला स्तुप हा अन्य ठिकाणी पहायला मिळत नाही.या स्तुपाच्या भोवती बारा अष्टकोणी खांब (प्रत्येकी उंची ३.३५ मी.) आहेत आणि वरती गोलाकार घुमट. या स्तुपांभोवती प्रदक्षिणामार्ग कोरला आहे,या अष्टकोनी स्तंभानी जणु स्तुपाभोवती फेर धरला आहे. दगडी स्तूपाचा बाह्यभाग योग्यरितीने तासून अगदी गुळगुळीत केलेला आहे. स्तूपाचा आकार गोलाकार असून बाजूने असलेल्या प्रत्येक स्तंभाचा आकार अष्टकोनी आहे. त्यांचा खालचा भाग रुंद व वरती थोड्या प्रमाणात निमुळता होत गेलेला आहे. त्यामुळे हे स्तंभ किंचितसे आतल्या बाजूला कललेले दिसतात. विशेष म्हणजे या स्तंभांना स्तंभपाद व स्तंभशीर्ष नाहीत. स्तंभांच्या भोवती वर्तुळाकार प्रदक्षिणापथ (१.०७ मी. रुंद) आहे. स्तूपाच्या वर घुमटाकार छत असून, त्यावर प्रदक्षिणेच्या छतावर लेणे कोरले त्यावेळी लाकडी फासळ्या (तुळया) बसविल्या होत्या. आजमितीस महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे औरंगाबाद, नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये बहुतकरून बौद्धलेण्या आढळतात. अजिंठा, कार्ला, बेडसे, भाजे या ठिकाणी असलेल्या लेणी समूहांमध्ये तुळजा लेणी पेक्षाहि अतिशय विशाल असे स्तूप कोरलेले दिसतात. मात्र अशी सभोवती गोलाकार स्तंभ असलेली दुर्मिळ स्तूपरचना तुम्हाला केवळ तुळजा लेणीमध्येच अनुभवायला मिळेल.महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय असे हे चैत्यगृह.भारतापुरते बोलायचे झाल्यास राजस्थानातील बैराटजवळ ते आढळते.
या चैत्यगृहाचे छतही फारसे न बघायला मिळणार्या घुमटाच्या आकाराचे आहे.यामध्ये लाकडी तुळ्याची रचना होती हे तिथे असलेल्या खाचांवरुन स्पष्ट होते. आज ओबडधोबड वाटणार्या लेण्याचा दर्शनी भागही लाकडी तुळ्यांनी बंद केला जायचा,एकुणच लेणी निर्मितीच्या सुरवातीच्या काळातील वर्तुळाकार रचना आणि लाकडीकामाचा प्रभाव यामुळे हे लेणे महाराष्ट्रात सुरवातीच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी एक असावे.
जुन्नर परिसरातील बहुतेक लेण्यांमध्ये माती,तुसाचा गिलावा करुन त्यावर चित्रकाम केलेले होते,असे चित्रकाम तुळजा लेण्यातही होते.लेण्याच्या छतावर आणि भिंतीवर मातीचा गिलावा आहे.यावर चित्रे रंगवली असावीत. आज हि रंगचित्र जवळपास नष्ट झाली असली तरी एकेकाळी इथे चित्रे होती असे ओळखण्या इतपत पुरावा आहे.एका उभ्या स्त्रीचे दृष्य आणि फुलाची अस्पष्ट दिसणारी नक्षी, यावरुन हे लेणे अजिंठ्याच्या लेणे क्रमांक १० च्या समकालीन असावे असे वाटते.
या लेणीची प्रसिध्दी हेन्री कुझेनच्या कानावर गेली , मुंबई गव्हर्नर व तो या लेणी पहान्यासाठी येणार होते असा निरोप जून्नरच्या कलेक्टरला मिळाला .गव्हर्नर येतात म्हणून लेणीची साफसफाई करुन घेण्यात आली .वाढलेली झुडपे ,कोळी किष्टके , पाकोळ्याची घाण ,काढण्यात आली . ही घटना १९१८ मधील आहे . पाणी टाकुन गोणपाट - कांबळीच्या मदतीने लेणीच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या .त्यामुळे सर्व चित्रे नष्ट झाली .जेव्हा गव्हर्नर, हेन्री कुझेन आले ...बघतात तर काय ? तो हा प्रकार ... जे पाहण्यसाठी आले तेच नष्ट झालेले होते . अतिऊत्साह व अज्ञाना पायी ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला होता.झालेल्या प्रकारामुळे त्यांनी कपाळावर हात मारुन घेतला. या बाबतचा तेंव्हाचा अहवाल आजही पुरातत्व खात्याकडे आहे .नाही म्हणायला प्रदक्षिणा पदाच्या उजव्या बाजुच्या छतावर अस्पष्ट झालेली कमलपुष्पाची वर्तुळे आणि प्रवेशमार्गाच्या डाव्या खांबावर दिसणार्या काही चित्राकृती काळाआड गेलेल्या ठेव्याची आठवण जागवतात. या चैत्यगृहाच्या स्तूपासमोर इतर चैत्यगृहांत आढळतो तसा आयताकार सभामंडप नसावा, असे दिसते; परंतु चैत्यगृहाला दरवाजा असल्याच्या खुणा येथे आढळतात.
या चैत्यगृहाचे समोरील बाजु अस्तित्वात नसली तरी याची तुलना भाजे लेणी आणि कोंदीवटे लेण्याशी करता येते. याच्या वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्यावरुन हे लेणे दक्षिण भारतात कोरलेल्या प्रारंभिक लेण्यांपैकी असावे असे वाटते.कदाचित ते भाजे लेण्यांच्या काळात कोरले गेले असावे. सुरेश जाधव यांनी तुळजा लेणे क्र. तीनशी पितळखोरा लेणे क्र. ३, अजिंठा लेणे
क्र. १०, भाजा व कोंडाणे येथील चैत्यगृहांचा तौलनिक अभ्यास करून तुळजा
लेणे क्र. तीनचा काळ इ. स. पू. सुमारे ६५-५३ ठरविला आहे. तसेच
स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यांवरून हे चैत्यगृह दख्खनमधील प्रारंभीच्या
लेण्यांपैकी एक असावे, असे दिसते. एस. नागराजू यांच्या मते, तुळजा
लेणी-समूहातील लेणे क्र. १, ६, ७ व १३ विहारांच्या स्थापत्यविकासाच्या
पहिल्या टप्प्यातील उदाहरणे असून ती इ. स. पू. ३०० ते २५० या दरम्यान खोदली
गेली असावीत.
चैत्यगृहाची हि शोभायात्रा संपवून विहार बघायला सुरवात करायची.
तुळजा लेणी उत्तराभिमुख असून त्यांत एकूण तेरा लेणी आहेत. यांपैकी लेणे
क्र. ३ हे चैत्यगृह; तर उर्वरित विहार व इतर सामान्य खोल्या आहेत. त्यांतील
बहुतेकांची प्रवेशद्वारे काळाच्या ओघात तुटलेली आहेत. यांशिवाय तीन अपूर्ण
लेणी व दोन पाण्याची टाकी या लेणी समूहात खोदली आहेत. या लेण्यांत अद्यापि
एकही शिलालेख आढळलेला नाही. लेणी समूहामध्ये एकूण १२ विहार कोरले आहेत. काही विहार हे कोठारांच्या स्वरूपात असून काही विहार हे बैठकीच्या योजनेनुसार आहेत. पुरातन काळामध्ये बौद्धधर्म प्रचारकांना तसेच इथे मुक्कामी येणाऱ्या प्रवाशांना विसाव्यासाठी विहाराच्या आत-बाहेर कोरलेले दगडी बाक दिसतात. पुरातन काळी ह्या विहारांना बंदिस्त करण्यासाठी लाकडी दरवाजे वापरत. ह्या दरवाजांच्या कडी-कोयंड्यासाठीच्या दगडी खोबण्यादेखील काही विहारांचा चौकटींपाशी दिसतात. पाण्याच्या सोयीसाठी दोन खोदीव टाक्यांची रचना केलेली दिसते. टाक्यांपर्यंत जाण्यासाठी खोदीव पायर्यांचा मार्ग बनवलेला दिसतो.
काही विहारांच्या छतावर बाह्यबाजूने कोरलेली वेलबुट्टीदार नक्षी देखील आवर्जून पाहण्यासारखी आहे. ह्या नक्षीकामामध्ये छ्त्रीसहित असलेले छोटे बौद्धस्तूप, विहारांना असलेले अर्धवर्तुळाकार नक्षीदार झरोके, गंधर्व-किन्नर, मेदीका आणि फुलं-पानांच्या नक्षीचे कोरीवकाम दिसते. एकूण १२ विहारांपैकी चौथ्या विहारामध्ये तुळजाभवानी देवीची मूर्ती स्थापन केली असल्यामुळे ह्या लेणी समूहाला तुळजा लेणी हे नाव रूढ झाले आहे.मध्ययुगात या मुर्तीची कधीतरी स्थापना झाली असावी.
बाजुलाच बौद्ध भिक्षु साठी विहार,भोजनालय, सभा मंडप कोरले आहेत. काही ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केलेले पहायला मिळते. बुद्ध,धम्म,संघ या तीन रत्नांचे त्रिरत्न चिन्ह सुद्ध जुन्नर येथील प्रत्येक लेणी मधे कोरलेले दिसते.पावसाळ्यात डोंगरावरुन कोसळणारे धबधब्याचे पाणी थेट लेणी समोरच पाणपोढी मधे साठवले जाते.पावसाळ्यामधे लेणीचे सौंदर्य अधिकच खुलुन दिसते.लेणी मधुन समोर असलेला विस्तीर्ण जुन्नर तालुका,शिवनेरी किल्ला दिसतो.
लेणे क्र. १ : सामान्य खोली आहे. लेणे क्र. २ एक विहार असून आत चौरस मंडप आहे. आतील डावीकडील व मागील भिंतीत प्रत्येकी दोन व उजवीत एक अशा एकूण पाच खोल्या बौद्धभिक्षूंच्या निवासासाठी खोदलेल्या आहेत. लेणे क्र. ४ :- लहानसे विहार असून त्याचा दर्शनी भाग तुटला आहे. डावीकडील मागील बाजूस दोन खोल्या असून एकीस आधुनिक लाकडी चौकट बसविली आहे आणि बाजूच्या खोलीत तुळजाभवानीची स्थापना केली आहे.
लेणे क्र. ५ ते १२ :- यांचा दर्शनी भाग संपूर्णपणे तुटलेला आहे. लेणे क्र. ८ ते १२ पर्यंत कड्याच्या वरच्या बाजूस काही कलाकुसर व थोडीबहुत शिल्पे शिल्लक राहिली आहेत.या विहाराच्या दर्शनी भागावर एक शिल्पपट आहे.त्यात एक स्तुप ,त्याची पुजा करणारे भक्त्,दांपत्य, चैत्यकमानी आणि वेदीका पट्टीची नक्षी या सार्याने हा शिल्पपट नटलेला आहे. त्यांत वेलबुट्टी, वेदिका, चैत्यकमानी इ. सुबकपणे कोरलेल्या दिसतात.पण याहुन विशेष म्हणजे या शिल्पपटामध्ये या स्तुपाच्या पुजेत सहभागी होण्यासाठी स्वर्गलोकीचे किन्नर सहभागी झाल्याचे दाखवले आहे.कमरेच्या वरील भाग मानवाचा तर उर्वरीत भाग मोराचा असा हा किन्नर त्याच्या आगळ्यावेगळ्या रचनेने लक्ष वेधून घेतो. मानवी चेहरा पण डोक्यावर तुर्रेदार फेटा,मागे पिसारा आणि पक्ष्याचे नाजुक पाय या सर्व रचनेतून एक वेगळाच जीव आपल्यासमोर उभा रहातो. या कलाकुसरीचे व शिल्पांचे साम्य मानमोडी टेकडीवरील भूतलेणी समूहातील शिल्पांशी मिळते-जुळते आहे.
लेणे क्र. १३ :- हे या गटातील शेवटचे लेणे असून बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर लागते. याचाही दर्शनी भाग तुटलेला असून आतील चौरस मंडपात बाजूच्या व मागील भिंतींत खालच्या बाजूस दगडी बाक कोरलेले आहेत. याचा बैठक किंवा सभागृहासाठी उपयोग केला जात असावा. अलीकडेच तुळजा लेणींच्या पश्चिमेस साफ-सफाईचे काम चालू असताना अजून काही खोल्या आढळून आल्या आहेत. आपण शिवनेरी किल्ला बघण्यासाठी कधी जुन्नर ला आलाच तर जवळच असलेल्या या ऐतिहासिक तुळजा बुद्ध लेणीला अवश्य भेट दया. जुन्नरच्या अगदी जवळ असूनही जास्त प्रसिद्धी न मिळालेली पण त्यामुळेच कि काय अतिशय शांत आणि निवांत असलेली हि तुळजा लेणी .
संदर्भ :
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर २) Jadhav, Suresh V. Rock-cut Cave Temples at Junnar-An Integrated Study, Ph.D. Thesis submitted to the University of Poona, 1980. ३) Nagraju, S. Buddhist Architecture of Western India, Delhi, 1981. ४) Suresh, Vasant, ‘Tulja Leni and Kondivte Chaityagrihas: A Structural Analysis’, Ars Orientalis, Michigan, 2000. जाधव, सुरेश वसंत, जुन्नर-शिवनेरी परिसर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९८२. जामखेडकर, अ. प्र. संपा., महाराष्ट्र : इतिहास-प्राचीन काळ (खंड-१ भाग-२) स्थापत्य व कला, दर्शनिका विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२. ५) मंजिरी भालेराव, प्रतिक साबळे, केव्हीन स्टँडेज, श्री. सुरेश खैरमाळे यांचे लिखाण ६ ) http://www.behistorical.com/tulja-caves-near-junnar-detail-information/ हा ब्लॉग ७) सांगाती सह्यद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
Having explored the better known rock-cut caves near Pune (Bhaja, Bedse and Karla), I decided to take a day excursion to Junnar (90 km from Pune) to see and photograph further examples.
The Junnar region in Maharashtra has the largest number of rock-cut caves in India, numbering over 200 independent excavations and spread over the four hills. All the caves here belong to the Hinayana phase and are datable from mid 3rd century B.C. to late 3rd century A.D.
The presence of so many rock cut excavations with a large number of associated inscriptions (enabling paleographical study) makes Junnar a prominent site for the study of rock cut architecture in India.
Junnar group of caves are classified into various sub-groups depending upon the location of these excavations. They are:
Tulja Lena – located on Tuljabai hill, 5 km west of Junnar.
Manmodi – located on Manmodi hill to the southwest of the town. Here there are a further three distinct groups :
Lenyadri(also known as Ganesh Lena) – located north of the town.
Tulja Lena is the smallest group at Junnar, with 11 caves datable from 1st century B.C. to 1st century A.D. These caves are situated together in a row and face roughly east-northeast.
Of the 11 caves here, by far the most interesting is Cave 2.
Here the excavation consists of a round room with the stupa located at the centre. Twelve octagonal pillars encircle the stupa, with a wonderfully carved domed ceiling above.
It’s quite unlike any other rock-cut cave I have seen before or since, but I really don’t know how many other examples may exist.
Once the whole cave was painted and you can see very small traces of this on the aisle roof and lower part of the dome (below, if you look carefully, you can make out squares of lighter colour).
Junnar was an important trade center in the 1st century A.D. – the town was located on a trade route leading from the Satavahana capital Paithan to the rich ports at the Arabian Sea. The route was busy transporting carnelian and textiles to the Middle East and the Roman Empire, so the path was also often travelled by ancient Greek and Middle East traders.
As a result, Buddhism was spread by the merchants and some of the earliest Buddhist monasteries were established along the trade routes.
Cave 3 is a small vihara with an open verandah, cell to the right, middle room and two cells in the rear wall of middle room. This cave has been turned into a shrine of the Hindu goddess Tulja.
Two cells in the rear part have been united into one room. This room now contains a 0.9 m high figure of the Tulja goddess, an avtar of the Hindu Goddess Parvati, she has eight hands and is riding a lion.
I would imagine the architecture of cave 2 makes Tulja Lena quite an important site, and being the smallest assemblage of rock-cut excavations in the region means it gets far fewer visitors.
Despite this however, I was saddened see that time has not been kind to these caves. Most of the caves, and in particular cave 2 with that wonderful Chaitya hall, have been littered with graffiti and modern day carvings (as you can see from the photos).
I have visited over 300 ancient and archaeological sites in India, some in urban areas, others in seemingly quite remote areas. I have never experienced this level of vandalism before, and to be honest it’s a mystery to me why somewhere like this has been subjected to it.
Sunil clearly has a back catalogue of girlfriends…
जुन्नर परिसरातील सर्वांत प्राचीन बौद्ध (थेरवाद) लेणी समूह. या लेणी
जुन्नरच्या पश्चिमेस सुमारे ३.५ किमी.
I wish the ASI would at least make an effort to clean up the caves,
if no graffiti existed it may deter others from making a start.
Unfortunately seeing the monument being defaced like this will be my
lasting memory of it, But thankfully I can’t think of any other
comparable sites in this respect, so for me it is at least an anomaly.
You’re welcome to ‘Like’ or add a comment if you enjoyed this blog
post. If you’d like to be notified of any new content, why not sign up
by clicking the ‘Follow’ button.
If you’re interested in using any of my photography or articles
please get in touch. I’m also available for any freelance work
worldwide, my duffel bag is always packed ready to go…
No comments:
Post a Comment