Monday, May 16, 2022

निमगिरी

 सातवाहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुरेख स्वप्नं. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला अन् त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात बुलंद किल्यांची निर्मिती झाली. त्या काळी नाणेघाटा पासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गांवी बाजारपेठ वसली गेली. जुन्नर परिसरातील किल्ले म्हणले कि चटकन आठवतात ते शिवनेरी,चावंड्,जीवधन आणि हडसर हि दुर्गचौकडी.मात्र याखेरीज या परिसरात आणखी काही उपदुर्ग आहेत, जसे नारायणगड्,सिंदोळा,भैरवगड आणि निमगिरी.सातवाहन यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले यातील एक किल्ला म्हणजे किल्ले निमगिरी. निमगिरीच्या शेजारीच हनुमंतगड नावाचा जोडदुर्ग आहे. निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका लहानशा खिंडीने वेगळे झाले आहेत. आज आपण निमगिरी आणि हनुमंतगड यांची सफर करणार आहोत.
nimgiri 2 - Copy

    सह्याद्रीच्या बालाघाट रांगेची निसर्गाच्या लावण्याची उधळण प्राप्त असलेली ही पश्चिम व पूर्व पसरलेली रांग आहे. ती पुणे, अ.नगर आणि नाशिक या जिल्ह्यांतुन एक देखण्या कड्यांची रेषा निर्माण करत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प व हेमाडपंती मंदिरे आहेत, माळशेज, दर्या्घाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक सौंदर्यमय घाट वाटा आहेत. यातील हरिश्चंद्रगड एकटाच उजवीकडे असून बाकी सर्व डावीकडे आहेत असे म्हणावे लागेल. हरिश्चंद्रगडाच्या एकदम समोर सिंदोळा व त्या समोर निमगिरी किल्ला आहे. श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी दुसरी सुरतेची लुट याच निमगिरीच्या पाऊलवाटेने केली व पुढे शत्रुसैन्याची भनक कानी येताच याच मार्गावर असलेल्या कुकडी नदीच्या पात्रातील डोहात ती लुट बुडवून ते निश्चिंत होऊन पुण्याकडे रवाना झाले असे या परिसरातील गावकरी मानतात. आज याच डोहाचे नाव माणिकडोह म्हणून जुन्नर तालुक्यात प्रसिद्ध असून याच नावाने माणिकडोह धरण बांधण्यात आले व येथेच बिबटय़ा निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
  
 निमगिरी गावाकडे जाताना
 
किल्यावर पोहोचण्याच्या वाटा : 
    येथे येण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुणे–मुंबईहुन सर्वप्रथम जुन्नर गाठावे. जुन्नरजवळ माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच जुन्नरपासून २५ कि.मी.वर तर हडसर गावापासुन १० कि.मी.वर खांडीची वाडी गाव आहे. या वाटेने २ कि.मी.चा फेरा जरी वाढत असला तरी निमगिरीला जाणारा हा सर्वात चांगला मार्ग आहे. खांडीची वाडी गावामागेच निमगिरी व हनुमंतगड हि दुर्गजोडी वसली आहे. निमगिरी गावाजवळ पुढे पायथ्याला असणार्‍या "खांडीची वाडी" या गावात जावे. मुळ डांबरी रस्त्याला फाटा देत एक कच्चा रस्ता अगदी सरळ निमगिरीच्या दिशेने जातो.बरेच दुर्गभटके हडसरच्या जोडीला निमगिरी बघतात.हडसरचा पायथा ते निमगिरीचा पायथा पायी चालत जायला तीन साडे तीन तास लागतात.या भागातील किल्ले बघण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे. हडसर आणि निमगिरी याच्यामध्ये एक डोंगर आडवा येतो.तो ओलांडणे सराईत प्रस्तरारोह्कांना शक्य आहे.उत्तम म्हणजे गाडीमार्गाने मोठा वळसा घालून आपण निमगिरी गावात दाखल होतो. निमगिरीला एस.टी.बसने जायचे असेल तर जुन्नरवरुन सकाळी १०.१५, १२.३० आणि शेवटची मुक्कामी बस संध्याकाळी ६.०० आहे.तर निमगिरी ते जुन्नर बससेवा सकाळी ७.०० आणि ११.३० अशी आहे.
मुंबई मार्गे – मुरबाड – माळशेज – मढ – बागडवाडी – निमगिरी
पुणे मार्गे – जुन्नर – हडसर – निमगिरी
माळशेज घाट पार केल्यावर दोन किमी वर खुबी फाटा आहे. त्याच्या पुढे ४ किमी वर वेळखिंड लागते. वेळखिंड संपली की मढ पारगाव नावाचे गाव आहे.
या पारगाव वरुन एक रस्ता उजवीकडे जातो.
तो बोरवाडी – मढ मार्गे निमगिरी कडे जातो. हाच
रस्ता पुढे हडसरला पण जातो. पारगाव पासून निमगिरी ७ किमी वर आहे.
निमगिरी
 


        गावात आल्यावर खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड हे लक्षात ठेवुन चढाईला सुरवात करावी. निमगिरीचा तो काळा चकचकीत कातळकडा आपले लक्ष वेधुन घेतो.गावातून गडावर जाणार्‍या वाटेला बरेच फाटे फुटलेत्,तेव्हा वेळ वाचवायचा असेल तर उत्तम म्हणजे गावातून एखादा स्थानिक वाटाड्या घेंणे.
 

20181223_090340
स्वतःचे खाजगी वाहन आपण घेउन आलो असू तर गावातील प्राथमिक शाळेजवळ पार्क करता येईल.
arrow
     या वाटेवर रस्ता चुकू नये यासाठी झाडांना लाल रिबीनी बांधल्या आहेत. सुरवातीची पायवाट ही भाताच्या खेचरातून जंगलात जाते. या वाटेवर सर्वप्रथम अतिउच्च विजेचा दाब असणारा खांब दिसतो. या खांबाच्या पुढे असलेल्या शेतातुन वाट सोडुन डावीकडे गेले कि एक अलीकडेच बांधलेले काळुबाईचे मंदीर दिसते. या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी आहे.इथले अवशेष सापडण्यासाठी बरोबर एखादा स्थानिक व्यक्ति असलेला चांगला. 

ग्रामदैवत.
20181223_091836




या मंदिराच्या आवारात व वाटेवर प्राचीन मुर्ती आणि मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. काळुबाईचे मंदीर नव्याने बांधले आहे.याच्या प्रवेशद्वारात जुन्या मंदीराचे दगड वापरले आहेत.


मंदिराच्या मागील बाजुस दोन विरगळ व एक कोरीव मुर्ती आहे. येथुन मूळ वाटेवर परत येऊन वर चढायला सुरवात केल्यावर वरील टप्प्यावर एक मोठी विहीर आहे.
20181223_090618

20181223_092501

18157448_927572977383857_155181918640697258_n




20181223_091535

20181223_091523

 


9 व्या शतकातील पुष्करणी शिल्प..
 
या विहिरीच्या डाव्या बाजुस असलेल्या झाडीत पिंपळाखाली लहानशा चौथऱ्यावर मारुतीची मुर्ती आहे. या मुर्तीपुढे काही अंतरावर ४२ विरगळ एका रांगेत मांडुन ठेवल्या आहेत. इथे मोठ्या संख्येने इथे वीरगळ किंवा खरतर थडी पाहून प्रश्न पडतो कि इथे असे कोणते मोठे युध्द झाले कि इतके महत्वाचे वीर योध्दे धारातिर्थी पडावते.हि सर्व थडी शिवकालीन वाटतात.इथे एखादी मोठी लढाई झाली होती हे नक्की ,मात्र त्याबाबत निमगिरी मौन बाळगून आहे,हे आपले दुर्दैव.
 
 

BeFunky Collage

Memory Stones

Memory Stones

   या विरगळ अलीकडील काळातील असुन त्यावर फारसे कोरीव काम दिसत नाही. एका विरगळीवर मोडी भाषेत शिलालेख असुन उर्वरीत विरगळीवर मानव आकृत्या,शिवलिंग, नंदी कोरले आहेत.
खरतर या मंदिराचा परिसर विकसीत करण्यासाठी निधी मिळालेला होता,परंतु हा पैसा विहीरीचे खोलीकरण करुन अधिक पाणी साठा व्हावा यासाठी गेला.
     
 निमगिरी, हनुमंतगडाचा नकाशा
 
येथुन पुढे जाताना वाटेत वनखात्याने उभारलेला मनोरा व निवारा असुन या दोघांच्या मधील वाटेने वर निघावे. 
 Hanumantgad fort
 इथेच वनखात्याने निमगिरीची माहिती देणारा फलक लावला आहे
 GPS map of our trek
निमगिरीवर जायचा मार्ग

गडाच्या इतिहासात डोकावल्यास याचे फार कमी उल्लेख मिळतात. कदाचित हा गड सातवाहनकालीन असला तरी या गडाचा पहिला उल्लेख मिळतो तो, नानासाहेब पेशबे यांच्या काळातील.दि.१२ मे १७४३ मध्ये मौजे निंबगाव सावा तर्फे आळे येथील पाटलाने महसुलातील थकबाकी सरकार जमा केली नाही म्हणून त्याला निमगिरीच्या किल्लेदाराने कैद करुन त्याची रवानगी कैदखान्यात केली.त्यासंदर्भात एक पत्र आहे,ते असे:
  "मौजे निमगाव तर्फ आळे येथील पाटील किल्ले निंबगिरी येथील किल्लेदाराने जहागिरीनिमीत्त धरुन नेला आहे,तो सोडून देत नाही,सबब सोडवावयासी हुजरुन ( पेशव्यांकडून ) पत्र पाठविले होते ते अमान्य करुन पाटलास बेडी घातली सबब किल्ले मजकुराचू ( निंबगिरीची ) जहागिर आहे ते जप्त करुन किल्ले नारायणगडाकडे वसुल देविला असे.तरी जहागिरीचा वसुल किल्ले नारायणगडाकडे सुरळीत देणे.,किल्ले निंबगिरीकडे एक पैसा वसुल न देणे म्हणोन पत्र सादर १ मौजे बाभुळवाडी तर्फ गाजी भोईरे, १ मौजे बेलापुर तर्फे वो ( ओ) तुर, १ मौजे चिलेवाडी तर्फे वोतूर, १ मौजे बोरी बुद्रुक तर्फे आळे, १ मौजे शिरवली तर्फे आळे, १ मौजे भाईरे तर्फे गाजी भोईरे,१ मौजे जांबुत तर्फ अळे, १ मौजे वडनेर खुर्द तर्फ गाजी भोईरे, १ मौजे वडज तर्फ हवेली,१ मौजे आंबेगव्हाण तर्फ वोतूर, १ मौजे आणे तर्फे बेल्हे.सदरहु गावाविसी किल्ले नारायणगडास पत्र"
हे पत्र तसे समजायला सोपे आहे.मात्र इथे निमगिरी किल्ल्याचा उल्लेख निंबगिरी असा येतो. कदाचित या गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात निंबाची म्हणजे कडुनिंबाची झाडे असावीत.पुण्याच्या आसपास निंबगाव दावडी,निंबगाव -केतकी तसेच फलटणच्या आसपास निंबाळक या गावाच्या नावामागे निंबाच्या झाडांचे अस्तित्ब आहे. शाहु दप्तरात देखील या गडाचा उल्लेख निंबगिरी असाच येतो.
    विशेष म्हणजे निमगिरीचा जुळा द्य्र्ग हनुमंतगड यावर विशेष अवशेष नसले तरी याचा इतिहासात स्पष्ट उल्लेख आहे.पेशवाईच्या काळात बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत पेशवे-निजाम यांच्यात तह झाला.त्याच्या कराराप्रमाणे 'पेशवे सरकारात चांदवड्,धोडप्,कंचना,अचला,देहेर्,राजदेहेर्,मार्कंडा,सोनगड, पेमगिरी,ईंद्राई व निमगिरीजवळचा हणमंत्या असे बारा किल्ले निजामास द्यावे". याला संशोधक श्री. डिस्कळकर यांनी १४ ऑक्टोबर १७५० अशी तारीख दिली आहे.
 

 
 
 एका दृष्टीने सोयीचे पण दुसऱ्या बाजूने गडाचे विदृपीकरनास कारणीभूत
 
येथुन वर चढत जाणारी ठळक पायवाट थेट खिंडीतील किल्ल्याच्या पायथ्याच्या पायऱ्यापर्यंत जाते. पायऱ्यांच्या अलीकडे एक वाट उजवीकडे निमगिरीच्या डोंगरात कोरलेल्या गुहेकडे जाते. मंदीराजवळून गडाकडे चढणारा मार्ग खडा असल्यामुळे छातीचा भाता सुरु होतो. हि वाट एका घळीतून वर चढते.

 

 
 

 टेहळणीसाठी खोदण्यात आलेली हि गुहा खोदताना अर्धवट सोडुन देण्यात आली आहे. गुहेच्या छताला आधार देणारे खांब पायथ्यापासून कोरले आहेत.त्या खांबावर छिन्नी,हातोडीच्या खुणा आजही स्पष्ट दिसतात.
स्थानिक लोक याला 'घोड्याची पागा' म्हणत असले तरी त्यात फार तथ्य नाही.ही गुहा टेहळणीसाठी बनवलेल्या असावी कारण येथून समोर सारा प्रदेश स्पष्ट दिसतो.
 
 
 
 
 
 
 
 


दगडी तटबंदी मधे लपलेल्या पायऱ्या लांबून शत्रूला दिसून नाही येत या प्रकारची रचना या ठिकाणी अवलंबली आहे.
Hanumantgad Nimgiri fort Fort Trek
 
 


 बघितले तर नुसते ओबाड धोबड दगड... पण हलकासा पाऊस जेव्हा पडून जातो त्यावेळी याचे खरे रूप बगायला मिळते. पाण्याची धार अगदी सुबक रित्या वळवली जाते. ज्यामुळे आपण समजू शकतो त्या काळी या चे सौंदर्य कसे भासत असणार

 येथुन कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला मधील खिंडीत न नेता थेट निमगिरीवर नेऊन सोडतात. कातळात कोरलेल्या या सुंदर पाय-या म्हणजे या गडाचा अनमोल ठेवा आहे. एका ठिकाणी तीन पायऱ्या तुटलेल्या असल्याने तसेच या पायऱ्या फारशा वापरात नसल्याने काही ठिकाणी मातीचा घसारा पायऱ्यावर जमा झाला आहे व पायऱ्या मातीत अर्धवट गाडल्या गेल्या आहेत त्यामुळे सांभाळूनच या वाटेने वर चढावे लागते.
 पावसाळ्यात मात्र या पायर्‍या धोकादायक होतात.तेव्हा इथून संभाळून चढणे. खिंडीपासून ते माथ्यापर्यंत चढाईचा हा टप्पा रोमांचकारी आणि सुंदर आहे. वळणदार कातळ कोरीव पाय-यांनी जाताना वाटेत कातळात कोरलेली पहारेकऱ्याची एक चौकी लागते आणि उद्ध्वस्त दरवाजातून १० मिनिटात आपण निमगिरीच्या माथ्यावर पोहोचतो. थोडे साहस करण्याची तयारी असल्यास या पायऱ्यांनी वर चढावे अन्यथा या वाटेच्या खाली असलेली वाट वळणे घेत १५ मिनिटात निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधील खिंडीतुन वर गडावर येते. गडाच्या कातळात कोरून काढलेला पायरीमार्ग गड सातवाहन कालीन असल्याची साक्ष देतात. निमगिरीचा किल्ला समुद्रसपाटीपासून ३६३५  फूट उंचावर असुन साधारण लंबगोलाकार आकाराचा हा गड १० एकरवर दक्षिणोत्तर पसरला आहे. 
 

 मुख्य दरवाजा च्या आधी असणारी सैनिक देवडी..
 
गडावर प्रवेश करताना उध्वस्त दरवाजाच्या डाव्या बाजुला खडकात खोदलेली पहारेकऱ्याची गुहा वाटावी अशी जागा आहे.पण हे बहुधा पाण्याचे टाके आहे.
 
 
 ह्याच देवडी मधे वरून सरळ पायरी मार्गान उतरता येते.  येथून समोर दिसणाऱ्या हनुमंत गडावर लक्ष ठेवता येते.
 
 मुख्य दरवाजा जवळील गुप्त दरवाजा रचना
वरून उतरताना शेवटचा पायरी नंतर जवळ जवळ 8 फूट खाली देवडी मधे उडी मारून उतरावे लागते.
 
त्याच्या वरच्या बाजुला एक मोठे भगदाड पडलेले दिसते.त्यातून आत डोकावल्यावर टाक्यात उतरण्यासाठी पायर्‍या कोरलेल्या दिसतात.सध्या मात्र टाक्यात घसारा पडल्यामुळे आत पाणी साठत नाही.
 
निमगिरी वरून दिसणारा हनुमंतगड... अंकाई टंकाई किल्ल्याची नक्कीच आठवण या ठिकाणी होते
 
पाण्याच्या प्रवाहने राजमार्ग सुशोभीत करण्यासाठीची रचना

 
 गडाच्या या भागात व्यवस्थित तटबंदी दिसुन येते.
दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूने गडफ़ेरीस सुरुवात करावी. या वाटेने प्रदक्षिणा करताना सर्वप्रथम पाण्याच्या ३ टाक्या दिसतात. यापैकी एका टाक्यातील पाणी गाळून पिण्यास वापरता येईल. 
 20180711_151400
 
 20180711_151411
 
 
 
 
"Gajant-Lakshmi" idol, one can see two giant elephants in the sculpture
  या टाक्याच्या पुढे काही अंतरावर छप्पर उडालेले एक लहानसे घुमटीवजा मंदीर आहे. या मंदिराला लहानसा दरवाजा असुन समोर कोनाड्यात गजलक्ष्मीचे शिल्प व त्यासमोर शिवलिंग ठेवले आहे.या शिवपिंड व गजांतलक्ष्मी शिल्पाची पुजा करताना येथील भाविक दिसतात. गजांतलक्ष्मी शिल्पे जुन्नर तालुक्यात सर्वत्र म्हणजे पुर्वेला बोरी शिरोली पश्चिमेला नाणेघाट, उत्तरेला निमगिरी तर दक्षिणेला घंगाळधरे या ठिकाणी असून एकूण सहा शिल्पे आढळतात. जेथे धनसंपत्तीचा ढिग असेल अशाच ठिकाणी या शिल्पांचा वापर त्यावेळी प्रवेशाव्दाराला केला जात असे.त्यातील एक शिल्प येथे आढळते.स्थानिक लोक याला निंबाबाईचे मंदीर म्हणतात.
20180711_151340
 मंदिराच्या पुढील भागात खराब पाण्याची दोन टाकी आहेत. 
 
 
tanks hanu
 
Nimgiri Hanumantgad fort
 
How to reach Nimgiri Hanumantgad fort
सध्या या टाक्याची स्वच्छता करण्याचे गावकर्‍यांनी मनावर घेतले आहे.भविष्यात कदाचित या टाक्यातूनही पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.
Old Tomb

 20180711_151251
या टाक्यांच्या पुढील बाजुस तीन टाक्यांचा समुह असुन डाव्या बाजुला टेकाडाच्या उतारावर ३ लहान कबरी दिसतात.या बहुधा निजामशाही काळातील असाव्यात.

गडावरील वाड्याचे अवशेष...
 
Cellar with hay
 
 
Small entrance of the cave
 


Photo of Nimgiri & Hanumantgad - Twin Forts 20/27 by Gunjan Deshmukh

Photo of Nimgiri & Hanumantgad - Twin Forts 21/27 by Gunjan Deshmukh


वाटेच्या पुढील भागात तीन गुहा आहेत. यातील एक गुहा पडझड झालेली असुन उर्वरीत दोन गुहांचा वापर स्थानिक गुराखी पावसाळ्यात गुरे बांधण्यासाठी करत असल्याने त्या राहण्यायोग्य नाहीत. 
 शेवटच्या गुहेच्या आत पाण्याचे एक टाके असुन लहानसा दरवाजा असलेली अजुन एक गुहा आहे. वेळ पडल्यास ५ ते ६ जणांना या आतील गुहेत रहाता येईल. परंतु एक लेणी पुर्व डोंगर कपारीत अर्ध गाडलेली दिसून येते परंतु तेथे जाण्याचा मार्ग दिसत नाही हे एक आश्चर्य वाटते. मग येथे जाण्यासाठी कसा मार्ग होता ? तो काळाच्या ओघात गाडला गेला असेल का ? असे प्रश्न पडतात. 

wada
 गडाच्या पुढील भागात पहाऱ्याची चौकी सोडल्यास कोणतेही अवशेष नसल्याने येथुन गडाच्या मधील उंचवट्यावर चढायचे. या उंचवट्यावर काही उध्वस्त वास्तू अवशेष दिसुन येतात. 
 

Full view of the same stone
Stone with interesting inscription

इथेच आपल्याला जमीनीवर पडलेले एक शिल्प दिसून येते.मात्र हे शिल्प बरेचसे झीजल्यामुळे कशाचे आहे ,ते समजत नाही.
 
 
 

 20180711_153513
 
 या गडमाथ्याची उंची ३६२५ फुट आहे.या उंचवट्यावरून चावंड, जीवधन हरिश्चंद्रगड, हडसर, सिंदोळा किल्ले नजरेस पडतात. निमगिरी किल्ला जुन्नरच्या पश्चिम खो-यात असल्याने समोर माणिकडोह आणि मागे पिंपळगाव धरणाचा जलाशय दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास १ तास लागतो तर पायथ्यापासुन दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात. इतिहासाबाबत निमगिरी किल्ला मौन बाळगुन असल्याने दुर्गप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षिलेला आहे. पण येथील कातळकोरीव पायरीमार्ग पहायला या किल्ल्याला आवर्जून भेट दयायला हवी.
20180711_140957
निमगिरी -हनुमंतगड यांच्यामधील खिंड
निमगिरी आणि हनुमंतगडाला वेगळी करणारी खिंड...
 
   गुहा पाहून झाल्यावर पुढे आपण आलेल्या मार्गाने परत जावे लागते. किल्ला थोडा उतरून आल्यावर आपल्याला हनुमंत गडाकडे जाण्यासाठी छोटी पायवाट दिसते. हनुमंत गडावर पाहण्यासाठी काही नाही पण तुम्ही गडाच्या शेजारून जाउनसुध्दा गडावर गेला नाहीत, अशी मनामध्ये खंत भविष्यात वाटायला नको म्हणून एकदा भेट द्यायला हरकत नाही. 
nim hanu
 
Tree with direction arrowsइथे खिंडीत हनुमंतगडावर जाण्यासाठी रत्याची दिशा दाखवणारे बाण दाखवले आहेत. खिंडीच्या डाव्या बाजूचा हणमंतगड चढायला सुरुवात करायची. 
Beautiful rock cut steps of Hanumantgad
 
 20180711_153519
 


निमगिरी हनुमंतगड किल्ला
 



खिंड चढताना उध्वस्त केलेला नागमोडी पायरी मार्ग त्या काळची भव्यता आणि सुबकता भासून देतो.
डोंगरावर चढतांना मधेच कातळ कोरीव पायर्‍या लागल्या त्या पार करून आपण हनुमंत गडाच्या माथ्यावर पोहोचतो. हनुमंतगडाचे प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूचे बुरुज शाबुत आहेत. 
Incomplete structure of the door
 
 हनुमंत गडावरील हाच तो अचंबित करणारा दरवाजा... नीट निरखून बघितल्यास बाहेरून अत्यंत सुबकतेने काटेकोर बनवलेला हा दरवाजा मात्र आत आहे तोच कातळ दगड घेऊन बंद झालाय किंवा यावर पुढे कामच केले नाही गेले.
 
पण प्रवेशव्दार कमानी पर्यंत मातीत गाडलेले आहे. प्रवेशव्दारा वरील व्दारशिल्प विठ्ठलाच्या डोक्यावरच्या टीळयासारखे वाटते. मात्र चौकटीवरील गोलाकार व त्याला वर दिलेली शेंडी याचा अर्थबोध होत नाही.


 
 

 


गडावरील पाण्याचे 6 टाके आहेत

 
 चौकोनी चार बुरुज वाडा अवशेष...
 
हनुमंतगडावरून दिसणारा आणि मनमोहून टाकणारा निमगिरी किल्ला..
 
   प्रवेशव्दार पाहुन प्रवेशव्दारा मागील टेकडी न चढता उजव्या बाजूला तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर एक टाक पाहायला मिळते. टाक पाहून टेकडी चढुन गेल्यावर बालेकिल्ल्याचे चार बुरुज दिसतात. ते पाहून दरवाजापाशी परत आल्यवर आमची गडफ़ेरी पूर्ण होते. 
   हनुमंत गडावरून पुढे देवदौन्डया डोंगर दिसतो, याच डोंगरावर सन १९६२ चा विमान अपघात झाला होता. ७ जुलै १९६२ रोजी मध्यरात्री इटालियन एअरलाईन्सचे डग्लस डीसी - ८-४३ हे विमान दौन्डया डोंगराला धडकून कोसळेल होते. या भीषण अपघातात विमानातील सर्व ८५ प्रवासी, ९ कर्मचारी असे एकूण ९४ जण मृत्युमुखी पडले होते. 
 संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) डोंगरयात्रा-आनंद पाळंदे
३) शोध शिवछत्रपतीच्या किल्ल्यांचा -सतिश अक्कलकोट
४) सांगाती सह्याद्रीचा -यंग झिंगारो ट्रेकर्स
५) हडसर्,निमगिरी,चावंड्,जीवधन-नाणेघाट- महेश तेंडुलकर
६)  www.trekshitiz.com हि वेबसाईट
७) www.durgbharari.in हि वेबसाईट
८) http://pkothavade.blogspot.com/2014/12/nimgiri-fort-monsoon-hike.html, https://madhyalok.wordpress.com/2018/07/24/nimgiri/   हा ब्लॉग
















 



Going ahead, we can see three caves on the fort. These could have been used as granary.



If we go to the tallest point on the fort, we can see some  memorials.













No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...