Sunday, June 9, 2024

Sahydri Facebook Page

 कालौघात शाबूत राहिलेल्या भारतातील काही प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे पाचव्या शतकातील लाडखान मंदिर. नांव जरी लाडखान असले तरी हे एक शिवमंदिर आहे.कधी काळी १७ व्या शतकात लाडखान नावाच्या एका विजापूरी सरदाराने या भागात लष्करी तळ ठोकून मंदिराला आपली war room बनवले होते त्यामुळे ह्या मंदिराला "लाडखान मंदिर" हेच नांव पडले. आता त्याचे चालुक्य शिव मंदिर असे नामकरण करण्यात आले आहे. खूप पूर्वी लाकडी मंदिरे असायची त्याचीच काहीशी नक्कल करत ह्या दगडी मंदिराची निर्मिती करण्यात आली. लाकडाच्या जशा तुळया कौलारू छताकरता वापरलेल्या असतात ,तशाच दगडी तुळया या मंदिराच्या (गरज नसताना ) छताच्या बांधकामात वापरल्याचे दिसून येते.
हे दुमजली मंदिर असून, सभामंडपावर आणखी एक छोटेखानी बैठा कक्ष आहे.
या मंदिरातील मला सर्वात चकीत करून सोडणारी गोष्ट म्हणजे मंदिराच्या मुखमंडपात असणारी वरच्या कक्षात जाण्यासाठी असणारी दगडी शिडी! १९०० वर्षांपूर्वीची ही शिडी मी अभ्यास करताना कल्पना केली होती त्यापेक्षा कितीतरी वेगळी होती. अत्यंत सोपी रचना असणारी ही शिडी आज वापरतांना जरी गैरसोयीची वाटत असली, तरी त्या काळातील शिल्पकारांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय रहावत नाही.






नायकिणींच्या वाड्यात मिळाली अदिलशाही, मुघलकालीन कागदपत्रे
(शोधयात्रा-भाग ५)
मानसिंगराव कुमठेकर
मिरज
कागदपत्रांच्या शोधात भटकत असताना मिरजेतील नायकिणींच्या वाडयात कागदपत्रे असल्याची माहिती मिळाली. या नायकिणीं(नृत्यांगणा)ची वस्ती शनिवार पेठेत मोठ्या प्रमाणात होती. या नायकिणी श्रीमंत होत्या. त्यांचे मोठे वाडे शनिवार पेठ परिसरात होते. त्यापैकी काही वाडे पाडून तेथे आता अपार्टमेंटस् झाल्या आहेत. यापैकी काही वाड्यात मला अदिलशाही, मुघलकालीन आणि मराठाकालीन अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली.
मिरजेच्या या नायकिणी म्हणजेच नृत्यांगणांचे वास्तव्य आदिलशाही काळापासून येथे होते. शहरातील मिरासाहेब दर्ग्यात प्रत्येक गुरुवारी आणि उरुसामध्ये नाचण्या-गाण्यासाठी बादशाहाने त्यांना इनाम जमिनी बहाल केल्या होत्या. आपण ज्या अर्थाने आज त्यांच्याकडे पाहतो, तशा त्या नव्हत्या. दर्ग्याबरोबरच अंबाबाई मंदिरात त्यांची नाचगाणी होत. सरकार दरबारीही त्यांना नाचण्याची सेवा करावी लागे. राजाच्या दरबारात कुणी पाहुणा, नंतरच्या काळात गव्हर्नर, ब्रिटीश अधिकारी आला तर त्यांच्या मनोरंजनासाठी या नायकिणींना पाचारण केलं जाई. राजघराण्यात कुणाचं लग्न असो किंवा अन्य उत्सवप्रसंगी त्यांना मिरवणूकीपुढे नाचावं लागे.
महताब नायकिण, जमनावाली नायकिण, विजापूरवाली नायकिण, कागवाडवाली नायकिण अशा अनेक नायकिणी मिरजेत होत्या. अदिलशाही आणि मुघल काळात त्यांना इनामे मिळाली होती.
या नायकिणी दानशूर होत्या. राष्ट्रप्रेमी होत्या. लोकमान्य टिळकांवर राज्यद्रोहाचा पहिला खटला जेव्हा झाला, त्यावेळी त्या खटल्यासाठी महाराष्ट्रातून मदत उभारण्यात आली. यामध्ये मिरजेच्या नायकिणींनी मोठी मदत केली होती. या नायकिणींनी मिरजेत धर्मशाळा आणि मंदिरे उभारली.
नायकिणींचे रीतीरिवाज वेगळे होते. मुलगी वयात आली की कटयारीबरोबर तिचं लग्न लावत. आणि त्यानंतर ती नाचगाण्यासाठी पात्र होई. हा लग्नविधी ३-४ दिवस चाले. या नायकिणी साक्षर होत्या. सन १८५८ मधील त्यांच्या हस्ताक्षरांची पत्रे मला मिळाली आहेत.
शनिवार पेठेतील नायकिणींच्या वाड्यात लोखंडी ट्रंकामध्ये अनेक वर्षे पडून असलेली कागदपत्रे मला मिळाली, यामध्ये अदिलशाही आणि मुघलकालीन द्वैभाषिक इनामे, नायकिणींच्या कैफियती, २५० वर्षांपूर्वी पासूनच्या त्यांच्या वंशावळी, त्यांचे विशिष्ट प्रकारचे लग्नविधी, त्यांच्याकडे असणाऱ्या दागिन्यांच्या याद्या, दर्ग्यातील नाचगाण्याची हजेरी, त्यांच्या चालीरिती सांगणारी अनेक कागदपत्रे मला मिळाली.
इतिहासाने आजवर दुर्लक्षिलेल्या आणि समाजाने वेगळ्या नजरेने पाहिलेल्या 'नायकिणी' या उपेक्षीत घटकाची माहिती या कागदपत्रांतून मला झाली.
या नायकिणींच्या सामाजिक जाणिवा अत्यंत प्रगल्भ होत्या. एकदा कुणीतरी आपल्या ६-७ वर्षांच्या मुलीचे लग्न कटयारीबरोबर लावून तिला नाचगाण्यासाठी लावणार होते. त्यावेळी मिरजेतील नायकिणी एकत्रित आल्या, त्यांनी तत्कालीन संस्थानचे अधिकाऱ्यापासून ब्रिटीश पोलीटीकल एजंटपर्यंत पत्रव्यवहार करून, 'या मुलीचं खेळण्या बागडण्याचं वय आहे, तिला जारकर्माला लावण्यापासून वाचवा', अशी आर्जवं केलेली पत्रं मला याच कागदांच्या गठ्ठयांत मिळाली.
लोकमान्यांना मदत करणाऱ्या, लहान मुलींचे बालपण हिरावू नये, म्हणून संवेदनशील असणाऱ्या, मंदिरे -धर्मशाळा बांधणाऱ्या या नायकिणींची कहाणी बोलकी करणारी कागदपत्रे माझा संग्रह खऱ्या अर्थाने समृध्द करत आहेत. (क्रमशः)
©मानसिंगराव कुमठेकर
9405066065

बाजीरावांवरील निरर्थक आक्षेप आणि खंडन
एका पोस्टवर मित्रयादीतील सुहृदांनी टॅग केलं, ज्यात बाजीराव पेशव्यांवर अत्यंत उथळ आणि असंबद्ध आरोप करण्यात आले होते. खरंतर पोस्टकर्ते वैयक्तिक ओळखीतले असल्याने इथे मुद्दाम नाव घेत नाही, पण सदर पोस्टमुळे अनेकांचा गैरसमज होऊ शकतो त्यामुळे हे सविस्तर उत्तर देत आहे. मूळ पोस्टमध्ये बाजीरावांवर तीन आक्षेप आहेत. पहिला त्यांच्या वागण्यावर आक्षेप असून शाहू महाराजांच्या एका पत्राच्या आधारे बाजीरावांना 'उद्दाम' ठरवलं आहे. दुसरा आक्षेप त्यांना थेट 'स्वामीद्रोही' ठरवत छत्रपतींवर दबाव टाकण्याच्या विचित्र कल्पनेचा आहे, तर तिसरा आक्षेप हा दुसऱ्या कोणाला श्रेय मिळू नये यासाठीच्या संकुचित मनोवृत्तीचा आहे. हे आमचे मित्रवर्य तसे अभ्यासू आहेत, पण इथे मात्र कोणाच्या तरी नादाला लागून नको ते उद्योग करताना या तीनही घटनांचा आगापिछा विसरले असल्याने त्यांनाही याची थोडी उजळणी होईल.
ज्यांच्या घोड्यांच्या टापांनी कर्नाटक ते दिल्लीपर्यंतचा प्रदेश पिंजून काढला आणि स्वराज्याच्या अंमलाखाली आणला. ज्यांनी दिवस-रात्र, ऊन वारा पाऊस न बघता अथक मोहिमा काढल्या आणि फत्ते केल्या. ज्यांनी असे अनेक सरदार उदयास आणले जे पुढली पाच दशके स्वराज्याचे आधारस्तंभ बनले. ज्यांनी माळवा गुजरात, बुंदेलखंड, मारवाड असे प्रदेश अंकित करून तिथे आपापले सरदार कायमस्वरूपी नेमले आणि मराठ्यांचे राजकारण महाराष्ट्राबाहेर नेले आणि वाढवले अशा कर्तबगार महापुरुषाला तीनशे वर्षांनी "स्वराज्यद्रोही" म्हणणे हे केवळ त्याच्यावर लांच्छन लावणे नसून मराठ्यांच्या अजोड पराक्रमाचा मुर्तीमंत महामेरु आरोपांची लहान लहान बिळे करून पोखरण्याचा प्रकार झाला. हा प्रकार अर्थात क्लेशकारक तर आहेच पण एकंदरच मराठ्यांचा इतिहास डागळणारा आहे असे आम्हास वाटले म्हणून हा उत्तराचा प्रपंच.
मुद्दा क्रमांक १)
पोस्टकर्त्याने इथे रियासत खंड ३, पान क्रमांक २५३ वरील पत्रं दिलं आहे. राजवाडे खंड ६ मध्ये लेखांक १६ म्हणून छापलेल्या या पत्रात शाहू महाराज बाजीरावांना म्हणतात, "तुम्हांस हुजूर येण्याची आज्ञा करून वरचेवरी पत्रे सादर झाली असता अद्यापि येण्याचा विचार दिसत नाही.. तुम्हांकडून आलास होऊन दिवस घालविता.." हे संपूर्ण पत्र मोठं आहे, अभ्यासूंनी जरूर पहावं. पण या एका पत्राच्या आधारे पोस्टकर्त्याने बाजीरावांना त्यांच्या तत्कालीन हालचाली न पाहता आणि त्या पत्राचा आशय सुद्धा लक्षात न घेता 'उद्दाम' म्हटलं आहे.
या पत्रावर शके १६४४ एवढंच आहे. शके १६४४ सुरु झालं ७ मार्च १७२२ला, आणि ते संपलं २५ मार्च १७२३ला. बाजीराव या वेळेस काय करत होते? कुठे होते? त्यांची या वेळेस, म्हणजे पेशवाई मिळाल्यापासून सुरुवातीच्या तीन वर्षात कधी कोकण तर कधी माळवा अशी धावपळ सुरु आहे. जानेवारी १७२२ मध्ये कान्होजी आंग्र्यांच्या मदतीला जाऊन बाजीरावांनी पोर्तुगीजांशी तह केला. यानंतर त्याच वर्षी ते माळव्यात गेले आणि १७२३च्या मार्चच्या सुमाराला त्यांनी बुंदेलखंडात 'गोदू' नावाच्या कोण्या सरदाराचं पारिपत्य केलं (सं: पेशवे शकावली). बरं, दुसरा मुद्दा, या एका पत्रावरून बाजीराव शाहू महाराजांना भेटायला जात नाहीत असा अर्थ पोस्टकर्त्याने काढला. या वर दिलेल्या वर्षभरात बाजीराव पुढील तारखांना साताऱ्यात होते.
२४ फेब्रुवारी १७२२ (जमादि. १८)
९ जुलै ते ७ ऑक्टोबर १७२२ (जिल्काद १ ते मोहरम ७)
७ ऑक्टोबर १७२२ रोजी बाजीराव जे निघालेत ते पुढे सुपे सासवड भागात आले, आणि फिरत होते. तिथून पुढे २० नोव्हेंबरच्या सुमारास बाजीरावांनी पुण्याचा प्रांत सोडला ते अहमदनगर, औरंगाबाद (संभाजीनगर), पैठण, बऱ्हाणपूर, अशेरी, मकडाई, करत माळव्यात शिरले. इथे हंडिया, धार, बदकशा, आमझेरा, मांडू, करून पुन्हा आल्या वाटेने नर्मदेच्या काठी हुशंगाबादला आले. पुढे शिवणी-बऱ्हाणपूर करत नालछाला, आणि तसंच सरळ अकबरपूर करून पुन्हा साताऱ्याला आले. या वेळेस वर्षभराने बाजीराव साताऱ्यात आले आणि पुन्हा २२ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर असा जवळपास पाऊण महिना ते साताऱ्यात होते.
इथे गंमत अशी झाली, की माळव्यात बदकशा इथे बाजीरावांनी निजामाची भेट घेतली. वास्तविक या वेळेस निजामाला बादशहाने वजिरी सांभाळायला बोलावलं होतं, पण निजामाला ती नको होती. त्याला दक्षिणेतील त्याचं राज्य महत्वाचं होतं. शाहू महाराजांनी निजाम उत्तरेत जाताना त्याच्यासोबत आनंदराव सुमंतांना पाठवलं होतं. बाजीरावांची या सगळ्यावर नजर होतीच.
आता पुन्हा मूळ पत्राकडे येतो. त्याच्या सुरुवातीचा भागच असा आहे की, "तुम्ही विनंतीपत्र पाठवले ते प्रविष्ट जाहले, कित्येक निष्ठेचे अर्थ लिहिले." बाजीराव छत्रपतींना विनंतीपत्र पाठवतो आणि तरीही तो पोस्टकर्त्याच्या लेखी उद्दाम ठरतो! पत्रातीलच एक वाक्य आहे, "तुम्हीच (बाजीरावांनी) उद्योग केल्यास अगाध नाही, परंतु हयगयीने घडत नाही." या पत्रातील एक महत्वाचं वाक्य फार बोलकं आहे. "स्वामीसन्निध उभयपक्षींचे कल राखून चालण्यास एक चांगला योजावा" असं बाजीरावांनी कळवलं होतं. याचा अर्थ काय? तर सातारा दरबारातील प्रतिनिधी-सुमंत-डबीर ही माणसं बाजीरावांचे विरोधक असून बाजीरावांच्या मनसुब्यांना त्यांचा विरोध असे. या दोन्ही बाजू सांभाळण्यासाठी काही करावं असं बाजीरावांनी सुचवलं होतं. हे पूर्ण पत्रं आणि शाहू महाराजांची काळजी ही या गोष्टीचं फलित आहे. बाजीराव माळव्यात निजामाला भेटतात, थेट दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध आघाडी उघडून माळव्यात आपलं बस्तान बसवतात या गोष्टींनी दरबारातील बाजीरावांच्या विरोधकांनी उचल खाल्ली नसल्यास नवल. याच भीतीपोटी, त्यातून बाजीराव फौजेसह माळव्यात गेल्याने इथे "राज्यभारसंरक्षणार्थ सावधता" धरण्यासाठी शाहू महाराजांनी हे पत्रं लिहिलं आहे हे उघड आहे. याला प्रत्यंतर पुरावा आहे, नंतरही अशीच एक घटना घडलेली. (पुढच्या मुद्दा क्रमांक २ मधील 'इ' विभाग पाहावा.)
यातला शेवटचा मुद्दा म्हणजे कोणी असं म्हणेल की बाजीरावावर महाराजांचा एवढा विश्वास होता तर हे असं पत्रं लिहिण्याची गरज काय? तर हे पत्रं बाजीराव पेशवाईवर आल्याच्या पहिल्या तीन वर्षातलं आहे. यापूर्वी बाजीरावांनी अनेक युद्ध जिंकली असली तरीही पालखेड हे निःसंशय यश बाजीरावांनी मिळवलं आणि तत्कालीन जबरदस्त मुत्सद्दी पण शत्रू असलेल्या निजामाला मात दिली तेव्हापासून शाहू महाराजांचा विश्वास बाजीरावांवर कायमचा बसला, इतका की नंतर शाहू महाराजांची असंख्य पत्र आहेत ज्यात बाजीरावांचं प्रचंड कोडकौतुक केलं आहे. ती पत्रं न वाचता केवळ काल्पनिक इमले रचत पोस्टकर्त्याने बाजीरावांचा उद्दामपणा पुढे किती वाढला असेल वगैरे कल्पना केल्या आहेत.
वर दरबारातील दोन पक्षांबद्दल लिहिलं त्याबद्दल स्वतः शाहू महाराजांनी महादोबा पुरंदऱ्यांना मनातलं जे सांगितलं ते नमूद आहे. बाजीरावांनी शाहू महाराजांना विचारलेलं, "इन्साफ गैरवाजवी महाराजांच्या चित्तात कोणकोणते आले आहेत ते आज्ञा करावी, त्याचा विचार महाराज सांगतील तैसा करू". यावर महाराज म्हणाले, "आम्ही काय सांगणे? तुम्हांस कोणता न कलेसा आहे? जोपर्यंत तुम्ही व आम्ही अहो, तोपर्यंतच चालेल, पुढे चालणार नाही". थोडक्यात, मी असेपर्यंत बाजीरावाला सांभाळून घेईन, पुढे हे चालणार नाही, तेव्हा सावध राहा हा गर्भितार्थ होता याचा. याच पत्रात महाराजांनी बाजीरावांचं कौतुक केलं आहे, पण द्रव्याची आशा धरून कामं करतात असं महाराज म्हणतात ते बहुदा असंच कोणी गैरवाका समजावल्यामुळे असावं. (सं: पेशवे दप्तर १७, ले. ५२)
मुद्दा क्रमांक २)
दुसरा आक्षेप आहे तो निजामाकरावी शाहू महाराजांवर दबाव टाकण्याचा. ऑक्टोबर १७२४च्या एका यादीत (सं: पुरंदरे दप्तर खंड १, लेखांक ७७) चिमाजीअप्पा बाजीरावांना काही गोष्टी कळवत आहेत. त्या आधी, नुकतंच काय झालेलं हे कळावं म्हणून सांगतो- ३० सप्टेंबर १७२४ रोजी साखरखेडल्याला मुबारीजखान आणि निजामाच्या युद्ध झालं. शाहू महाराजांनी निजामाला मदत केली होती, आणि मराठ्यांकडून बाजीराव-पिलाजी जाधवराव निजामाच्या साहाय्यास गेले होते. या युद्धात बाजीरावांनी आणि पिलाजीरावांनी मोठं शौर्य गाजवल्याने निजामाने शाहू महाराजांना कौतुकाचं पत्रं पाठवलं, ज्यात तो बाजीरावांना 'शहामतपनाह' म्हणतो.
आता पुन्हा आक्षेप असलेल्या मूळ यादीकडे येऊ. दि. ९ ऑक्टोबर १७२४च्या या यादीत चिमाजीअप्पा लिहितात त्याचा सारांश असा- "बाजीरावांनी निजामाशी बोलणी करून ठेवावी की, ते माघारी आल्यावर पाठून निजामाचं पत्र शाहू महाराजांना यावं, ज्यात 'कर्नाटकच्या मोहिमेवर जाताना बाजीरावाला माझ्या मदतीला द्या' असं निजाम असेल. जर निजाम स्वतः गेला नाही तर ऐवजखानाच्या मदतीसाठी महाराजांकडून आपल्याला मागून घ्यावं." यातलं शेवटचं वाक्य असं आहे, "नवाबानी पत्रं राजश्री स्वामींशी ल्याहावें कर्नाटकात स्वारी, आथवा भागानगर प्रांते स्वारी झाली तरी रा. प्रधानपंत यासच पाठवणे." याचाही अर्थ सोपा आहे. वर जे दरबारी अंतर्गत विरोधक सांगितले आहेत त्यात प्रतिपक्षाकडून बारामतीकर नाईक वगैरे मंडळीही कर्नाटकात जाण्यासाठी उत्सुक होती. कारण कर्नाटकचा मुलुख अत्यंत सधन होता, जसा मध्यप्रांतांत माळवा होता. या ठिकाणी मोहीमशीर होण्यात सरकारचा आणि सरदारांचाही फायदा असे. चिमाजीअप्पांनी इथे निजामकरवी वशिला लावला असं म्हटलं जाऊ शकतं केवळ. कारण या वेळेस निजामाने बाजीरावांचं मोठं कौतुक केलं होतं, आणि शाहू महाराजही अजून तरी निजामाच्या बाजूचे होते. निजामाशी थेट शत्रुत्व हे १७२६पासून सुरु झालं जेव्हा निजामाने स्वतःहून पालखेडची मोहीम उघडली. चिमाजीअप्पांच्या या संबंध पत्रात कुठेही महाराजांवर 'दबाव' टाकण्याची भाषा नाही, किंवा महाराजांना सोडून शत्रुपक्षात जाण्याचं संगनमत नाही. उलट, निजामाचा आत्ता आपल्यावर विश्वास बसला आहे आणि महाराजांचाही निजामावर विश्वास आहे हे पाहून त्या निमित्ताने कर्नाटकची मोहीम पदरी पाडून घ्यावी म्हणजे तिथे स्वराज्य, पर्यायाने शाहू महाराजांचंच राज्य वाढवता येईल असा साधा सोपा विचार या यादीमागे आहे. तरीही, कसलाही अर्थ ध्यानी न घेता पोस्टकर्त्याने इथे बाजीरावांना थेट 'स्वामीद्रोही' म्हटलं आहे. बरं, निजामाकडून ही पत्रं आलीही असावी, कारण पुढे लगेच कर्नाटकच्या मोहिमा शाहू महाराजांच्या आज्ञेने सुरु झाल्या, ज्यात फत्तेसिंह भोसल्यांना मुखत्यारी दिली असली तरीही बाजीरावांनाही पाठवण्यात आलं होतं. या वेळीही निजामाशी बिघाड करू नये अशी शाहू महाराजांचीच इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार आपण वागत असल्याचं पत्रं बाजीरावांनीच शाहू महाराजांना लिहिलं आहे (सं: राजवाडे खंड ६ मध्ये लेखांक २२).
आता या दोन गोष्टींवरून बाजीराव उद्दाम आणि स्वामीद्रोही असतील तर शाहू महाराजांनी हे खपवून घेतलं? बरं, नुसतं खपवून घेतलं, दुर्लक्ष केलं तरी चाललं असतं, पण बाजीराव जाईपर्यंत शाहू महाराज त्यांचं कौतुक करायचे, त्यांची मर्जी जपायचे हे कसं होईल? पोस्टकर्त्याला शाहू महाराजांच्या क्षमतेवर बोट ठेवायचं आहे का? मी पुराव्याशिवाय बोलत नाही. खाली काही मोजकी उदाहरणं देतो, कारण सगळी द्यायची तर इथे एक पोस्ट पुरणार नाही.
अ) पालखेडच्या मोहिमेनंतर शाहू महाराजांनी कोणालातरी म्हटलेलं, "बाजीरावांची मर्जी सगळ्यांनी पाळावी, त्यांच्या चित्तास क्षोभ करू नये" (सं: पेशवे दप्तर १७, ले. १३)
आ) वर एके ठिकाणी म्हटलं तसं महाराजांनी बाजीरावांचं कौतुक करताना म्हटलंय, "आजकाल ईश्वरेच्छेने प्रधानपंतांच्या सर्व गोष्टी सर्वोत्कर्ष आहेत. याची कीर्ती भूमंडळी बहुत दिवस राहील. यशास आणि कीर्ती-ग्रहस्थास, स्वामीसेवेत आणि इतरही गोष्टीत कोणत्याही प्रकारे अंतर नाही." (सं: पेशवे दप्तर १७, ले. ५२)
इ) वर जे शाहू महाराजांच्या पत्राबद्दल आणि बाजीरावांना भेटीला यायला वेळ नसल्याबद्दल सविस्तर विवेचन केलं आहे, त्याला जोडून हा आणखी एक उल्लेख. नंतरच्या काळातही धामधुमीत प्रत्येक वेळेस लगेच लगेच साताऱ्यात जाऊन महाराजांची भेट घेणं बाजीरावांना जमत नसे. शाहू महाराजांचा बाजीरावांवर प्रवचन्द विश्वास आणि जीवही. ते मात्र कासावीस होत. याबद्दल खुद्द ताराबाईंचं एक पात्र आहे ज्यात त्या म्हणतात, "तुमचे येणे काळेकरून घडणार नाही, आणि यांस क्लेश भोगण्याची सीमा राहिली नाही. त्यापक्षी, याचे (शाहू महाराजांचे) समाधान तेच रक्षून तुम्ही सर्व राज्यभर चालवावा हेच तुम्हांस योग्य आहे. चिरंजिवांचे लक्ष तुमचे ठायी दुसरे नाही." (सं: पेशवे दप्तर ३०, ले. २२७)
मुद्दा क्रमांक ३)
पोस्टकर्त्याने पुन्हा इथेही केवळ एका पत्रावरून बाजीरावांना स्वराज्यद्रोही आणि स्वामीद्रोही ठरवलं आहे. पत्र काय, तर सेखोजींचे सरदार बकाजी महाडिकांना बाजीरावांनी सांगितलेलं की "तुम्ही व प्रतिनिधी एकत्र काम करता, असे समजले तर हे करू नये." मूळ गोष्ट अशी आहे -
एप्रिल १७३३ मध्ये बाजीराव मोहीमशीर झाले, आणि मी च्या पहिल्या आठवड्यात त्यांची छावणीव राजपुरीला पडली. महिनाभरात बाजीरावांच्या सैन्याने सिद्दीची बहुतांशी ठाणी जिंकून घेतली. या अवधीत बाजीरावांनी रायगडावरही संधान बांधलं होतं. (सं: काव्येतिहास संग्रह पत्रे यादी, ले. २२) सिद्दी रहमानला जंजिरा देऊन त्यांच्याकरवी जंजिरेकर सिद्दी आपले अंकित करायचे आणि रायगडचा ताबा मिळवायचा हा बाजीरावांचा प्लॅन होता. (सं: पुरंदरे दप्तर १, ले. १०६). प्रतिनिधींना महाराजांनी नेमलं तेव्हा बाजीरावांची अपेक्षा होती की ताज्या दमाची फौज जी कामं मोठी व अजून सुरुवात व्हायची आहे तिथे जाईल. पण प्रतिनिधी आले तेच थेट महाडला. उंदेरी आणि अंजनवेल हे सिद्दीचे दोन हात जाया करणं गरजेचं होतं. पण प्रतिनिधींनी ते केलं नाही. जे रायगडचं राजकारण बाजीरावांनी जवळपास पूर्ण होत आणलं होतं ते आयतं घ्यायला प्रतिनिधी महाडला गेले. (सं: पुरंदरे दप्तर १, ले. १०२). सगळ्यात महत्वाचं एक पत्र आहे ज्यात महादोबांनी बातमी कळवली आहे. बाजीराव आणि फत्तेसिंह भोसल्यांनी आपली साताठशे माणसं पाचाडला पाठवून चौकी बसवली होती, आणि किल्ल्याशी बोलाचाली सुरु होती. अशात प्रतिनिधी महाडला येऊन राहिले आणि त्यांनी परस्पर शाहू महाराजांना कळवलं, "रायगडचं काम माझ्याकडे आलं आहे, मला काय आज्ञा?" आता महाराजांना आतल्या गोष्टी चटकन न समजल्याने त्यांनी प्रतिनिधींना रायगड घेण्याची आज्ञा केली आणि प्रतिनिधींनी पुढची कारस्थानं केली. (सं: पेशवे दप्तर ३, ले. ४).
इथे बाजीरावांकडून एक लहानशी चुकही झाली आहे, आणि त्याबद्दल मी माझ्या पुस्तकात सविस्तर लिहिलंही आहे. पण ती चूक सहजगत्या झालेली आहे. प्रतिनिधी वगैरेंच्या विरुद्ध नाही. असो, मुद्दा हा की ८ जून १७३३ रोजीही बाजीराव, "रायगडचेही राजकारण आहे, लक्षप्रकारे येईल" असं म्हटलं (सं: पेशवे दप्तर ३३, ले. २७). या सगळ्यात बाजीराव दुसरीकडे गुंतले आहेत हे पाहून इकडे प्रतिनिधींनी, बाजीरावांच्याच योजलेल्या सगळ्या योजनेला आपलीच योजना म्हणून रायगड घेतला. ही गोष्ट पुण्याला कळली तेव्हा अप्पा गोंधळात पडले, त्यांनी बाजीरावांना विचारलं, "रायगडावर निशाणे चढली यैसे साताऱ्याहून लिहिले येथ आले, परंतु स्वामींकडून (बाजीरावांकडून) पत्र न आले. ऐसियास किला तो फते झालाच असेल, परंतु किल्ल्यावर लोक कोणाचे गेले, किल्ला सांप्रत स्वाधीन कोणाचे आहे ते पाहावयास आज्ञा केली पाहिजे." (सं: पेशवे दप्तर ३, ले. ७)
प्रतिनिधींचे हे उद्योग केवळ बाजीरावच नाही, तर इतर सरदारांनाही नकोसे झालेले. रघुनाथ हरी लिहितात, "पंतप्रतिनिधि आले नसते तर इतकीया दिवसात आम्ही मोर्चे सेऊन भांड्याच्या माऱ्याखाले (गोवळकोटाचे) येक दोन बुरुज पाडिले असते." (सं: पेशवे दप्तर ३, ले. १०). पोस्टकर्त्याने पत्र मुद्दाम खोडसाळपणाने दिलं आहे का कळत नाही. कारण त्या पत्राच्या अगदीच दोन पत्र मागे जाऊन असलेला वेगळ्याच पत्रातील मजकूर त्यांनी वाचला असता तर ही वेळ आली नसती. रायगडच्या आणि रघुनाथ हरीच्या अनुभवावरून बाजीरावांनी बकाजी नाईकांना सावध केलं आहे. ते म्हणतात, "श्रमशाहास तुम्ही कराल, आणि राजश्री पंतप्रतिनिधी आले आहेत ते यशास पात्र होतील" (सं: पेशवे दप्तर ३, ले. १५). आणि म्हणूनच पुढच्या पत्रात ते बकाजींना म्हणतात, "ते तुम्ही येक होऊन काम करता म्हणोन कळों येते, तर हे गोष्ट कार्याची नव्हे. आपले राजकारणात दुसरेयाचा पाय सिरू देऊ नये." (सं: पेशवे दप्तर ३, ले. १९). बाजीरावांनी हे सांगितलं ते योग्यच आहे याचा अनुभवही बकाजींना आला, म्हणूनच याच पत्रात ते बाजीरावांना म्हणतात, "आपण नीतिन्यायाने लिहून जे पाठवलं आहे ते यथार्थच आहे". स्वतः कान्होजींची पत्नी, सेखोजींची आई लक्ष्मीबाई आंग्रे यांनी प्रतिनिधींची बकाजी नाईकांच्या बाबतीतली लबाडी उघड केली आहे. (सं: पेशवे दप्तर ३, ले. २१). स्वतः सेखोजी आंग्र्यांनी पंतप्रतिनिधींबद्दल म्हटलंय, "प्रतिनिधींचा विचार घालमेलीचा व शामलाचे ममतेचा पहिल्यापासून आहे, तो आपणास अवगतच आहे. कोकणच्या मनसुब्यास दोन्ही गोष्टी कार्याच्या नाहीत त्यांचा आमचा बनाव न बसे, तेव्हा मनसुबा काय होणे आहे? शामल दगेखोर, जागाजागा रातबारीत छापे घालून उपद्रव देईल. प्रतिनिधी उठोन जातील ते कळणार नाही. गोद्विजांचा उच्छेद केल्याचे श्रेय आपले पदरी पडेल" (सं: पेशवे दप्तर ३, ले. ४३)
असो, फार लांबवत नाही. लिहिण्यासारखं पुष्कळ आहे. पण एका लहानशा अन निरर्थक पोस्टने गैरसमज लोकांमध्ये चटकन पसरतात, ते होऊ नये म्हणून चार ओळींच्या चुकीच्या खोडून काढायला असं विस्तृत उत्तर द्यावं लागतं. टीम पाऊलखुणा आणि आमची सुज्ञ अभ्यासक मंडळी याच ध्येयाने काम करते आहे.
बहुत काय लिहिणे? लेखनावधी!
- © कौस्तुभ कस्तुरे

जावळी तालुक्यातील कुडाळ परगण्याच्या आमच्या शिंदे देशमुखांचे घराण्याचे शिक्के. शिक्यांवरील मायना खालील प्रमाणे
१) पहिला शिक्का -मोर्तब सूद ,
२) दुसरा शिक्का- सूर्याजी बिन तुबाजी देशमुख परगणे कुडाळ, यावर नांगर ही निशाणी आहे.
३) तिसरा शिक्का -शिंदे देशमुख कुडाळ.
बहामनी काळापासूनची कुडाळ ६० गाव खोऱ्याची देशमुखी कुडळाच्या शिंदे घराण्याकडे आहे. सदरचे शिक्के हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आमचे पूर्वज श्रीमंत सुर्याजीराव तुबाजीराव शिंदे देशमुख शिक्केकरी यांचे आहेत. हा काळ सर्वसाधरण 1645 चा आहे. हे शिक्के आजही आमच्या घराण्याने जीवापाड जपले आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातही आमच्या घराण्याने स्वराज्य रथ पुढे नेण्याचे कार्य केले.
इंग्रज आमदानीतही इंग्रज सरकारातून आम्हास देशमुखीची नक्त नेमणूक मिळत होती आणि स्वातंत्र्यानंतरही १९५० पर्यंत भारत सरकारकडून देशमुखी नक्त नेमणूक वार्षिक ₹ १८१२/- मिळत होती. पुढे BOMBAY PARAGABA AND KULKARNI VATANS (ABOLITION) ACT 1950 नुसार १९५१ पासून नक्त नेमणूक बंद झाली आणि त्याबदल्यात शासनाने ०१ मे १९५१ ते ३० एप्रिल १९७१ अशी वीस वर्षाची नुकसान भरपाई दिली.
त्याकाळी फक्त कुडाळ गावचे क्षेत्र १०० चावर ( म्हणजे जवळपास १२०० एकर ) आमच्याकडे होते. तसेच इतर ५९ गावामध्ये आमच्या घराण्याच्या जमिनी होत्या.
त्यासर्व जमिनींवर शासनाच्या त्याकाळच्या धोरणांमुळे पाणी सोडावे लागले.
स्वातंत्रोत्तर काळात बहुतेक मराठा घराण्यांना आपल्या जमिनीचा त्याग करावा लागला. हे फार मोठ योगदान आहे आपल्या सर्व मराठा घराण्यांचे आजचा महाराष्ट्र घडविण्यात.
आजच्या उपलब्ध इतिहासामध्ये बऱ्याच मराठा घराण्याचा इतिहास अप्रकाशित आहे. आज गरज आहे अश्या वैभवशाली आणि क्षात्रतेज असणाऱ्या घराण्याचा इतिहास जगापुढे आणण्याची.
नजीकच्या काळात लवकरच घेऊन येऊ आमच्या शिक्केकरी शिंदे देशमुख घराण्याचा अप्रकाशित परंतु क्षात्रतेजयुक्त जाज्वल्य इतिहास
धन्यवाद
लेखन आणि संकलन-श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी
कुडाळ परगणे जावळी प्रांत

स्वातंत्र्यलक्ष्मी अंतर्धान पावली..!!
... वैशाख वद्य अमावस्या, शके १७४०, बहुधान्यनाम संवत्सरे, बुधवार दि.३ जुन १८१८ रोजी अशीरगडजवळ ढोलकोट (धूळकोट) मुक्कामी सकाळी १० च्या सुमारास दुसरे बाजीराव पेशवे इंग्रज अधिकारी जनरल माल्कम ह्याच्या स्वाधीन झाले आणि त्याच दिवशी मराठी राज्याचे उदक त्याच्या हातावर सोडले..!!
सन १८१८ च्या २० फेब्रुवारी रोजी मराठ्यांचे मुख्य सेनापती बापू गोखले पडल्यानंतर पळापळ करत असलेल्या दुसऱ्या बाजीरावांना कुठेही आसरा मिळाला नाही. अखेरीस त्यांनी आपला वकील १६ मे १८१८ रोजी महूच्या इंग्रजांच्या लष्करी छावणीत जनरल मालकमकडे पाठवला. १ जूनला जनरल मालकमने बाजीरावांना इंग्रजांच्या अटी स्पष्टपणे कळवल्या. त्या अश्या :
१) (बाजीरावाने) राज्याची साफ सोडचिठ्ठी द्यावी.
२) पुन्हा दक्षिणेत जाऊ नये
३) तळेगांवाजवळ ज्यांनी दोन गोरे इसम मारले ती माणसें व त्रिंबकजी डेंगळे यांस इंग्रजांचे हवाली करावे
४) रामदीन व पेंढारी सरदार तुमच्या जवळ आहेत त्यांस घालवून द्यावे
५) तुम्ही खुद्द जनरल डोव्हटन यांचे स्वाधीन व्हावे. तसे केल्यास,
६) तुम्हास कोणत्याही प्रकारची तोशीस न पडता उत्तर हिंदुस्थानात एकाद्या क्षेत्राच्या ठिकाणी स्वस्थपणे राहण्याची परवानगी मिळेल.
या जाचक अटी सैल करून घेण्याचा बाजीरावांनी अटोकाट प्रयत्न केला. पण जनरल मालकमने जुमानले नाही. शेवटी २ जूनला जनरल मालकमने बाजीरावांना निर्वाणीचा इशारा (अल्टिमेटम) देऊन आपला निर्णय २४ तासात कळवायला सांगितलं.
तेव्हा मात्र दुर्दैवाने बाजीरावांना काही अटी ह्या त्यांच्याकडून इंग्रजांना आणि काही अटी इंग्रजांकडून बाजीरावांना मिळाल्यानंतर बाजीरावांनी मराठी राज्याचे उदक सहजपणे इंग्रजांच्या हाती सोडले.
त्या अटी पुढीलप्रमाणे : -
१) इंग्रजांकडून बाजीरावांना सालीना ८ लाख रुपये तनखा मिळेल.
२) बाजीरावांच्या पक्षाच्या सरदारांना इंग्रजांकडून कोणतीही तोशीस लागणार नाही
३) पेशव्याने पुन्हा दक्षिणेत पाऊल न ठेवता कायम उत्तरेकडेच रहावे.
४) पेशवे स्वतः किंवा पेशव्यांचे वारस पेशवाईच्या गादीवर किंवा मुलखावर हक्क सांगणार नाहीत.
त्याप्रमाणे त्यास उत्तरेत गंगाकाठी रहाण्याची परवानगी देण्यात आली व बऱ्याच चौकशीअंती कानपुराजवळ बिठूर उर्फ ब्रह्मावर्त हे क्षेत्र बाजीरावाने पसंत केल्यावर पुढे त्यांची रवानगी तिकडे करण्यात आली.
या दुर्दैवी प्रसंगाचे वर्णन ग्रँड डफने '..Never was an empire so foolishly lost..' अश्या अगदी सूचक शब्दात करून ठेवले आहे.
© स्वराज्यसेवक
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
संदर्भ :
१) पेशवे घराण्याचा इतिहास : प्रमोद ओक
२) मराठे व इंग्रज - नरसिंह चिंतामणी केळकर
३) मराठी रियासत : उत्तर विभाग-३
(सन १७९५-१८४८) - गो.स.सरदेसाई
४) दिनविशेष - प्रल्हाद नरहर जोशी
.....................................
चित्र : प्रातिनिधीक


अणहिलवाड़ पाटन गुजरात के परमभट्टारक महाराजाधिराज परमेश्वरभिनवसिद्धराज श्री भीमदेव द्वितीय चौलुक्य कुल चूड़ामणि का विशाल सम्राज्य।
सम्राट भीमदेव द्वितीय ने अपनी रानी लीला देवी के नाम से लिलापुर शहर बसाया लीलेश्वर महादेव भीमेश्वर महादेव मंदिर का निर्माण करवाया। इस लेख से यह ज्ञात होता है।
सम्राट भीमदेव द्वितीय का शासनकाल अणहिलवाड़ पाटन के समस्त राजाओं से अधिक रहा ६३ वर्षों तक।
सम्राट भीमदेव के दो महारानियां थी - महारानी लीला देवी जालौर के चौहानो की बेटी थी
व दूसरी महारानी सुमला देवी आबू के परमारो की बेटी थी
सम्राट भीमदेव द्वितीय- पृथ्वीराज चौहान तृतीय की मृत्यु के बाद 40 वर्षों तक जीवित थे - पृथ्वीराज रासो में लिखा है कि पृथ्वीराज के हाथों से भीमदेव की मृत्यु हुई जो गलत लिखा हुआ है।
अणहिलवाड़ पाटन के चौलुक्य के ताम्रपत्र शिलालेख सैकड़ों संख्या में मिल रहे।
"चौलुक्यकुलतिलकबलवीरसिंहबासनी

ASI confirms rock carvings discovered in Goa are from #Neolithic period. Mauxi (Mhaus) village in the Sattari taluka has shed light on some captivating aspects of Goa’s Neolithic period through the discovery of ancient rock carvings.
These carvings, etched into the meta basalt rock on the dry riverbed of the Zarme river, offer a glimpse into Goa’s distant past. The carvings predominantly feature animals, such as zebus, bulls, and antelopes, along with footprints and cupules—circular cavities on the rock surface.
The discovery of these carvings, initially made by local residents about 20 years ago, underscores the significance of community involvement in uncovering historical artefacts. Around 20 rock etchings have been identified in this area, showcasing the use of the bruising technique. Additionally, tools from the same period have been found on the riverbed, further validating the site’s historical importance.

*कोल्हापूर येथील शिलाहार राजवटीतील वैशिष्ट्यपूर्ण सोन्याची नाणी.*
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर कसबा बीड नावाचे प्राचीन खेडेगाव आहे. या गावात दरवर्षी मृग नक्षत्र ते स्वाती नक्षत्र या कालावधीत काही लोकांना शेतात,घराच्या कौलांवर,उसाच्या पातीवर अशा विवीध ठिकाणी सोन्याची नाणी अचानक सापडतात. १० व्या ११ व्या शतकामध्ये या भागात शिलाहार राजा भोज याची राजधानी होती.
तेव्हा पासून दरवर्षी ही नाणी येथे सापडतात. नाण्यांवर असणाऱ्या चिन्हांवरून आणि काही अक्षरावरून ही नाणी शिलाहार राजांची असावीत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
या प्रकारची नाणी भारतात अन्यत्र कुठेही सापडत नाहीत. हा नाणे प्रकार दुर्मिळ असुन ज्या प्रकारे ही सापडतात ते या नाण्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.महत्वाचे म्हणजे ही नाणी बीड गावच्या वेशीतच सापडतात. या गावात प्राचीन महादेवाचे मंदिर व खुप वीरगळी देखील पहायला मिळतात.
*बीडात सोन्याचा पाऊस पडतो अशी म्हणायची पद्धत आहे या गावात.* मिळालेली सोन्याची नाणी लोकं आपल्या देवघरात श्रध्देने पुजतात. सहसा ही नाणी कोणीही विकत नाहीत.
*नाण्यांबद्दल माहिती.*
या भागात साधारण चार-पाच प्रकारची नाणी सापडतात.
पैकी काही नाण्यांवर एका बाजूस त्रिशुळ,फुल व दुसऱ्या बाजूस तुरीच्या डाळी सारखा प्लेन उंचवटा असतो.
काही नाण्यांवर एका बाजूस मधे त्रिशुळ त्याच्या एका बाजूस चंद्र सुर्य व दुसऱ्या बाजूस शिवलिंग असते. त्याच्या मागील बाजूस पाय मुडपून बसलेला गरुड व त्याच्या हातात धरलेला सर्प(साप) पहायला मिळतो. हा नाणे प्रकार कमी पाहण्यात येतो.ही नाणी ०.१००/०.४००/०.८००मिलीग्रॅम
वजनाची असतात.
*©अमेय श्रीकृष्ण गोखले. कोल्हापूर.*
Mob : 8408065200
*नाणी संग्राहक व अभ्यासक.*
*16 April 1853 is an important milestone in Indian history,
when the railway passenger train
ran for the
*First time in Greater India.
This train crossed 34 km between *Mumbai
(then Bombay) and Thane.
*This historic journey was the beginning of the era of modern transportation in India,
which had a profound impact on Indian society, economy and culture.
*First passenger train travelled from *Bori Bandar station (present Chhatrapati Shivaji Maharaj terminus) to
Thane.
*This train had three engines!
*There were 14 cans in the train and there were
*400 passengers on board.
*During this historic journey,
the train started its journey with a salute of 21 cannons.
*The journey completed in about 75 minutes
and laid the foundation for the development of *Indian Railways.
*Railway network in India expanded rapidly,
after the successful event of the first train journey.
*Till the end of 19th century,
thousands of kilometers of railway lines were laid in India.
*This not only improved transport facilities,
but also gave new direction to India's economy.
*Agricultural products,
*industries and *business activities were boosted
and helped connect various parts of the country.
*Railways brought significant changes in Indian society too.
*People got the facility of moving from one place to another,
increasing cultural and social exchange.
*People from different fields could meet each other,
strengthening unity and integrity.
*Also, new opportunities for education and employment were औरिसें!

शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रधान अण्णाजी दत्तो उर्फ सध्या अनाजीपंत नावाने मालिकेत केले गेलेले बदनाम, त्यांचे कार्य कर्तृत्व* सांगणारा हा लेख.
लेखक- अतृप्त चंद्रकोर
(मालिका, कथा, कादंबरी, सिनेमा म्हणजे खरा इतिहास असतोच असे नव्हे)
___________________________
इतिहासात अनेक महान व्यक्तिरेखा झाल्या त्यांचा उदो उदो आजही केला जातो. ज्यांच्याकडून चुका झाल्या त्यांना शिव्या आजही समाज घालतो. याउलट मुघली लुटेरा इतिहास व त्यांचे वंशज आज स्वतःच्या मुलांचे नाव तैमूर ठेवत आहेत. औरंगजेब आज संत होत आहे ,तर टिपू सुलतान समाज सुधारक !!!! काल तर आम्हाला " आनाजीची पिल्लावळ " अशी उपाधी प्राप्त झाली. मग आम्ही विचार केला अण्णाजीपंत खरंच एवढे वाईट आणि कर्तव्य शून्य पदाधिकारी होते का ??? याच मुद्द्यांना धरून विषय मांडत आहोत...
{या लेखामध्ये आम्हाला अण्णाजीपंत दत्तो यांचे उदात्तीकरण करायचे नाही , परंतु अण्णाजीपंत दत्तो यांचे स्वराज्यासाठीचे योगदान जरूर मांडणार. }
छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेत असताना मुख्य अभ्यास ठरतो तो अष्टप्रधान मंडळाचा. मुळात कालच्या मूर्खासोबत वाद झाला त्याला अष्टप्रधान मंडळ म्हणजे काय हे देखील ठाऊक नव्हते. छत्रपतींचे प्रति रूप म्हणून अष्टप्रधान मंडळ हे ओळखले जात. ही अष्टप्रधान मंडळातील पदे म्हणजेच स्वराज्याच्या इमारतीचे स्तंभ !!! ही पदे म्हणजे सर्वसाधारण संघटनेच्या पदांप्रमाणे नव्हती ज्यांची खिरापत वाटली जावी. ज्यांचे स्वराज्यासाठी योगदान होते व जे स्वराज्यासाठी प्राणही अर्पण करायला तयार होते अशा व्यक्तींना छत्रपतींनी त्या पदांवर नेमले होते...
भाद्रपदशुक्ल षष्टी शके १५८३ म्हणजे २९ ऑगस्ट १६६१ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंत यांना वाकेनिसी दिली त्या नंतर भाद्रपदशुक्ल द्वादशी शके १५८४ म्हणजे १६ ऑगस्ट १६६२ रोजी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंत यांना सूरनिसी दिली. सुरनीस या फारसी शब्दाचा अर्थ “सुद सुद बार“ असा शेरा मारणारा . सनदा , हुकूमनामे , राजपत्र , महत्वाच्या निर्णयांची शासकीय कागदपत्रे तपासणे, त्यातील त्रुटि शोधून त्यातील चुकीचा मजकूर दुरुस्त करणे . महाल , परगणे यांचे हिशोब जमाखर्च तपासणारा कारकून . वित्त व लेखा अधिकारी . प्रसंगी युद्धात नेतृत्व करणे. शेतजमिनीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती त्यामुळे महसुलाच्या व्यवस्थेवरही लक्ष ठेवावे लागे. जमनीची मोजणी , सारा वसुली यात त्यांचे योगदान आढळून येते. चिटणीस बखरीनुसार धारा निशित करण्याचा प्रयत्न अण्णाजी दत्तो यांनी केला. “ अण्णाजीपंतांचा धारा “ हा शब्द प्रयोग पेशवाईतही रूढ होता.
शिवाजी महाराज आग्राहून सुखरूप स्वराज्यात आले व त्यांनी तहानुसार मोगलांना दिलेला स्वराज्याचा प्रदेश पुन्हा स्वराज्यात आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी मोरोपंत पेशवे व निळोपंत मजमदार व अणाजीपंत सुरनीस यांसी आज्ञा केली की , “ तुम्ही राजकारण , यत्न करून किल्ले घ्यावे .”
पन्हाळा किल्ला स्वराज्यात आणण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी अण्णाजीपंत व कोंडाजी फर्जंद यांच्याकडे सोपविली. प्रणालपर्वत ग्रह्नाख्यानतील नोंदीनुसार अण्णाजीपंत यांनी हेरांकरवी माहिती घेतली व कोंडाजी फर्जद यांच्याशी विचारविनिमय करून योजना आखली. अण्णाजीपंत हे पिछाडीचे रक्षण करण्यासाठी म्हणून ससैन्य जंगलात दबा धरून बसले. जेधे शकावलीतील नोंदीनुसार “ फाल्गुन वद्य १३ शके १५९४ पन्हाळा गड आणाजीपंती भेद करून कोंडाजी फर्जंद बरोबर लोक देवून घेतला. सभासद बखरीतील नोंदीनुसार “ स्वराज्याचा वाढता कारभार सांभाळण्यासाठी शिवाजी महराजांनी चेउलपासून दाभोळ , राजापूर , कुडाळ, बांदे, फौंड, कोपलपर्यंत कोकण अण्णाजीदत्तो यांच्या स्वाधीन केला. “मुंबईकर इंग्रज त्यांच्या १३ मे १६७५ च्या पत्रात लिहितात “ अण्णाजी हा तिकडील व्हाईसरॉयच्या अधिकारावरचा अंमलदार असल्यामुळे व चतुर असल्यामुळे आपल्या दर्जाप्रमाणे आपला मान ठेवला जावा असे त्याला वाटणे साहजिक आहे. तरी त्याचा योग्य मान ठेवा " सदर पत्रावरून अण्णाजीदत्तो यांचे स्वराज्यातील तत्कालीन महत्व लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर छत्र धरण्याचा मान अण्णाजीदत्तो यांना दिला होता . इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झेड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडावर नजराणे घेऊन उपस्थित झाला त्यावेळी त्याने अण्णाजीदत्तो यांच्यासाठी १२५ रुपये किमतीचे ७ तोळे वजनाचे २ सोन्याचे गोफ नजराणा म्हणून आणले होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अण्णाजी दत्तो यांना शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला हस्तगत करण्यास पाठविले परंतु अण्णाजी दत्तो कुडाळपर्यंत आला परंतु मह्मद्खानाला याचा सुगावा लागल्याने अण्णाजी दत्तो यांना या मोहिमेत अपयश आले. असे अनेक कार्य अण्णाजीपंत दत्तो यांनी स्वराज्यसाठी केली.
मुळात सुरुवातच इथून होते की सुरनीस हे पद कुणाही सर्वसामान्य माणसाला देऊन स्वराज्याची अपरिमित हानी कधीही सहन झाली नसती त्यामुळे त्या पदावर योग्य व्यक्तीची निवड छत्रपतींनी केली होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रति असणारी अण्णाजीपंत दत्तो यांची निष्ठा पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नव्हती. त्यामुळे पुढे आपल्या अतिशय चाणाक्ष बुद्धीचा वापर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात केला त्याबद्दल त्यांना आम्ही देखील दोषी मानतो. ज्याप्रमाणे मालिकांमध्ये त्यांनी केलेले दुष्कर्म दाखवले त्याप्रमाणे त्यांनी केलेले पराक्रम जर दाखवले गेले असते तर आम्हाला निश्चितच आनंद झाला असता !!!
तसे का केले गेले नाही त्याचे उत्तर जगजाहीर आहे आम्ही त्यावर बोलणे योग्य होणार नाही
जयतु हिंदुराष्ट्रम्
अतृप्त चंद्रकोर 🚩🚩🚩
कॉपी पेस्ट



जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर आणि महात्मा गांधी
डॉ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे अमेरिकेतील कृष्णवर्णीय कृषीतज्ञ आणि संशोधक अनेकांना माहिती असतील. त्यांनी आणि महात्मा गांधींनी एकमेकांना पत्रं लिहली होती. डॉ कार्व्हर आणि गांधीजी यांच्यातील हा पत्रव्यवहार State Historical Society of Iowa च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ही तिन्ही पत्रे त्यांतील भावार्थासह इथे देत आहे.
पहिले पत्र डॉ कार्व्हर यांनी चार्ली अँड्र्यूज, (महात्मा गांधींचे निकटचे मित्र)यांना लिहिले आहे. त्यात ते म्हणतात -
माझा विश्वास आहे की, अन्नाच्या बाबतीत आपल्यात जी चर्चा झाली, त्या कल्पना अनुसरल्या तर, मि. गांधींची शारीरिक प्रकृती खूप सुधारू शकते. जर त्यांनी गव्हाचे (whole wheat ) पीठ, ग्रिट्स, मका, चण्याचे पीठ इत्यादी गोष्टी, जे मी तुम्हाला दाखवलेल्या लहान गिरणीवरही तयार करणे शक्य आहे यांसोबत भारतात उपलब्ध असलेली उत्कृष्ट स्थानिक फळे व भाज्या, योग्य प्रकारे एकत्र करून, तुम्ही पोषक आणि चविष्ट अन्न तयार करू शकता. तुम्ही हे तुमच्या शाळेत वापरू शकता, जेणेकरून तिथले विद्यार्थी नंतर ही माहिती त्यांच्या विविध समुदायांमध्ये पोहोचवतील. मला वाटतं यामुळे भारतीयांचे आरोग्य, बल आणि आर्थिक स्वातंत्र्य यात भर पडेल. सोयाबीनसारखेच शेंगदाण्याचेही इमल्शन तयार करता येते आणि ते अन्नातील पोषकतत्त्वांमध्ये थोडे अधिक समृद्ध असते.
दुसरे पत्र रिचर्ड ग्रेग यांनी गांधींच्या वतीने कार्व्हर यांना लिहिले होते. या पत्रात ते लिहितात - महात्मा गांधी म्हणत होते, की तुमच्या कामाबद्दल त्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे. कदाचित तुम्हाला माहीत असेल की, गेल्या वर्षभरात गांधींनी भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या स्वदेशी उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यात आणि त्यांच्या स्वत:च्या स्थानिक संसाधनांचा वापर करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक ग्रामीण उद्योग संघ सुरू केला आहे. तुमच्या निग्रो लोकांसाठी केलेल्या कामाबद्दल थोडेसे वाचल्यानंतर, गांधींना अधिक जाणून घ्यायचे आहे, ज्यायोगे तुमचे काही शोध आणि आविष्कार (Discoveries and inventions) भारताच्या परिस्थितीस आणि उत्पादनास अनुकूल ठरतील. उदाहरणार्थ, कदाचित तुम्हाला माहिती असेल की, भारतात मोठ्या प्रमाणात शेंगदाणे पिकवले जातात. जर तुम्ही तुमचे शोध आणि कामांबद्दल काही लेख किंवा पत्रके त्यांना पाठवू शकलात, तसेच तुम्ही स्वत: त्यांना पत्र लिहिले, तर गांधींना खूप आनंद होईल. मला आशा आहे की तुम्हाला हे करण्यासाठी वेळ मिळेल. भारतातील अत्यंत गरीब लोकांसाठी, ज्यांचे वार्षिक दरडोई उत्पन्न, ब्रिटिशांच्या अधिकृत अंदाजानुसार, फक्त $27.50 आहे, त्यांना अशाप्रकारच्या शक्य त्या मदतीची गरज आहे.
यानंतर तिसरे पत्र कार्व्हर यांनी गांधींना ग्रेग यांच्या पत्राच्या उत्तरात लिहिले होते. यात, कार्व्हर यांनी काही बुलेटिन्स पाठविल्याचे सांगितले पण ती पोहोचली नसल्यामुळे आणखी पाठवण्याचे आश्वासन दिले. "गांधींच्या संपर्कात राहणे म्हणजे indeed a great pleasure and privilege" असे म्हणत डॉ कार्व्हर व्यक्त झाले आहेत. गांधींच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. "आपण करत असलेल्या या अद्भुत कार्यात ईश्वर नेहमीच तुम्हाला आशीर्वाद देवो, रक्षण आणि मार्गदर्शन करो." असे म्हणत कार्व्हर यांनी पत्राचा समारोप केला आहे.
मुळ पत्रांचे स्क्रीनशॉट इथे देत आहे. ती पत्रं वाचणं थोडं कठिण जात असलं, तर त्यावरून तयार केलेली पीडीएफ फाईल वाचता येण्यासारखी आहे. त्याची लिंक कमेंट सेक्शनमध्ये देत आहे.
डॉ. सागर





























दक्षिणेतील तंजावर च्या भोसले राजघराण्याचा दैदिप्यमान इतिहास-
सन १६२४ ला भातवडीच्या लढाई मध्ये निझामशहा चे वजीर शहाजीराजे भोसले यानी अवघ्या वीस हजार फोजे ने शहाजहान बादशहा आणि आदिलशहा च्या दोन लाख फौजेचा पराभव केला. शहाजीराजे भोसले यांचे किर्ती अवघ्या भारतात दुमदुमली. पण १६२६ ला निझामशहा आणि त्यांच्या कुटुंबीयांना फतेह खान याने कपटाने मारले त्या नंतर शहाजीराजे भोसले यांनी फतेह खान चा बंदोबस्त करून निझामशहा चा वारसदार म्हणून मुर्तजा याला बादशहा नेमुन राज्यकारभार हातात घेतला. पण पुढे तीन वर्षांत शहाजहान ने ४८००० फौजेकडून अहमदनगर वर हल्ला करून मुर्तजा ला आणि त्याची आई ला कैद केले. त्यामुळे शहाजीराजे यांनी शहाजहान शी तह करून मुर्तजा च्या सुरक्षेसाठी हमी घेतली आणि तहा प्रमाणे शहाजीराजे आदिलशाहीत सरदार झाले. त्याना पुणे सुपे चाकण इंदापूर प्रांताची जहागिरी देण्यात आली. त्या जहगिरीचे शहाजीराजे याचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घडवले. १६३८ ला आदिलशहा सरदार रणदुल्ला खान आणि शहाजीराजे यांनी बेंगळुरू च्या नायक चा बंदोबस्त करून बेंगरूळ ताब्यात घेतले. आदिलशहा ने शहाजीराजे यांचा फर्जंद किताब देऊन त्यांना बेंगरूळ ची जहागीर देण्यात आली. त्यानी आणि शहाजीराजे यांचे थोरले सुपुत्र संभाजी राजे यांनी नंतर दक्षिणेतील नायकांचा बंदोबस्त करून बेंगरूळ ची जहागीर वाढवली.
इ स१६७४ नंतर शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई ( मोहिते घराण्यातील) यांचे चिरंजीव व्यंकोजी राजे यांना बेंगरूळ ची जहागीर देण्यात आली. १६७५ ला व्यंकोजी राजे यांनी अलगिरी च्या नायकावर हल्ला करून तंजावर ताब्यात घेऊन राज्याची राजधानी बेंगळुरू हुन तंजावर ला हलवली.
इ.स १६८४ ला व्यंकोजी राजे यांच्या नंतर त्यांचे पुत्र शहाजीराजे हे तंजावरच्या गादी वर बसले स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे याना शहाजीराजे यांनी वेळोवेळी मदत केली. संभाजी महाराज यांनी जिंजी चा किल्ला आणि सुभेदारी आपले महुणे हरजीराजे महाडीक यांच्या कडे सोपवली. हरजीराजे महाडीक यांनी दक्षिणेत भागानगर चा अनेक सुभे जिंकून घेऊन स्वराज्याला जोडले. त्यावेळी तंजावरचे महाराज शहाजी राजे (शाहूजी) यांची मोठी मदत झाली.
पुढे छ संभाजीराजे यांच्या मृत्यूनंतर इ स१६९० ला छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी येथे स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केली. मुघल सरदार झुल्फिकारखानने जिंजी ला वेढा टाकला तेव्हा तंजावर महाराज शहाजी राजे यानी मराठ्यांना रसद पुरवठा केला. झुल्फिकारखान याच्या वर सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजीराव जाधव यांच्यासह तंजावरच्या शहाजीराजे यांच्या सैन्याने सतत हल्ले करुन जिंजीचा वेढा काही वर्षांसाठी उठवण्यात यश मिळवले. त्रिचनापल्ली चा नायक आणि तंजावर चे शहाजीराजे यांचे हाडवैर होते. शिवाय तो झुल्फिकारखान आणि मुघलांना मदत करत असे. राजाराम महाराज आणि संताजी घोरपडे यांनी १६९३ ला त्रिचनापल्ली वर हल्ला केला. आणि त्रिचनापल्ली किल्ल्याला वेढा टाकला. मराठ्यांचा राजा , सरसेनापती सह त्रिचनापल्ली वर चालून आला हे पाहून नायक मराठ्यांना शरण आला. २३ एप्रिल १६९३ ला त्रिचनापल्ली मराठ्यांच्या ताब्यात आले.
इ स १६९४ तंजावरचे महाराज शहाजीराजे यांच्या सहकार्याने राजाराम महाराज यांनी पांडेचेरी चे फ्रेंच, मद्रासचे इंग्रज पोर्तुगीज डच यांचा बंदोबस्त करून खंडण्या वसुल करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या वर जरब बसवली. शहाजीराजे यांचे नंतर तंजावर च्या गादीवर सरफोजी राजे बसले.
इ स १७१३ ला छत्रपती शाहू महाराज यांनी कर्नाटक चा सुभा शाहू महाराज यांचे मानस पुत्र अक्कलकोट चे फत्तेसिंह भोसले यांच्या कडे सोपवले. आर्काट चा नवाब सादुल्ला खान आणि तंजावर चे तत्कालीन महाराज सरफोजी राजे यांचे हाडवैर होते. नागपूरकर रघुजीराजे भोसले अक्कलकोट चे फत्तेसिंह भोसले आणि तंजावर चे सरफोजी महाराज यानी एकत्रित मोहीम काढुन कोप्पळ करनूर , कडप्पा, तिरुपती व्यंकटगिरी जिंजी अशा तंजावर ला स्वराज्यला जोडणार्या प्रदेशाची साखळी पुन्हा स्वराज्यात आणली. १७२३ ला छत्रपती थोरले शाहू महाराजांनी फत्तेसिंह भोसले आणि रघुजीराजे भोसले यांना निजामाचा उपद्रव कमी करण्यासाठी पाठवले. तंजावर कर राजांनी या मोहिमेत त्याना वेळोवेळी मदत केली. फत्तेसिंह भोसले आणि रघुजीराजे भोसले यांनी चित्रदुर्ग पासुन बिदनुर पर्यंत खंडण्या वसुल केल्या. आणि हा प्रदेश अंमला खाली ठेवला. सरफोजी महाराज यांच्या नंतर तुकोजी, प्रतापसिंह आणि तुळोजी यांची तंजावर चे महाराज म्हणुन कारकीर्द घडली. त्यानंतर १७८७ पासुन व्यासंगी विद्वान विद्याविभूषित प्रसिद्ध सरफोजी राजे दुसरे यांची कारकीर्द घडली.
शरभोजी उर्फ सरफोजी दुसरे यांचा जन्म २४ सप्टेंबर १७७७ साली तंजावरच्या राजघराण्यात झाला. तंजावरचे राजे तुळजाजी भोसले यांनी स्वतः ला वारस नसल्याने सरफोजीना दत्तक घेतले.
त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी जर्मन रेव्हरंड श्वार्ट्झ यांना देण्यात आली. या श्वार्ट्झला भारतीय संस्कृती आणि इतिहासात खूप रस होता . इंग्लिश, ग्रीक,लाटिन सोबतच संस्कृत, तमिळ, उर्दू या भारतीय भाषा सुद्धा त्याला अवगत होत्या. तल्लख सरफोजिंचा श्वार्ट्झला लळा लागला. सरफोजीनी सुद्धा वरील सर्व भाषांमध्ये प्राविण्य मिळवलं. त्याने श्वार्टझकडून राज्यकारभाराचे धडे घेतले.
सरफोजीना शिकवण्याच्या निमित्ताने तंजावरला आलेल्या श्वार्ट्झला तंजावर मध्ये असलेल्या “नायक” घराण्याच्या “सरस्वती महाल” लायब्ररीचा शोध लागला. या लायब्ररीमध्ये अनेक मौलिक ग्रंथ, हस्तलिखिते धूळ खात पडली होती. श्वार्ट्झला भारतीय भाषा येत असल्याने त्याने ती वाचून काढली. त्याला त्या ग्रंथांचे महत्त्व लक्षात आले. या ग्रंथांचे व्यवस्थित वर्गीकरण करून ते ग्रंथालय पुन्रोजीवीत करण्यात आले.
सरफोजी महाराजांना इथेच वाचनाची सवय लागली.
१७८७ साली महाराज सरफोजी हे तंजावरच्या गादीवर आले. सावत्र भाऊ अमरसिंग याच्या बंडामुळे काही काळ सरफोजी यांना सत्तेवरून बाजूला जावे लागले होते. मात्र श्वार्टझने इंग्रजांकडून सरफोजिंचा हक्क मिळवून दिला. १७९८ साली राजे सरफोजी ना परत राजगादी वर आले मात्र इंग्रजांनी त्यांना मांडलिकत्व स्वीकारायला लावले.
येथून पुढे सरफोजी राजांनी आपला वेळ युद्धलढाई राजकारण याच्यात घालवण्यापेक्षा सुसूत्र राज्यकारभार आणि विद्यासंचय या मध्ये घालवला.
तंजावरला विद्येचे माहेरघर बनवण्याचा मान सरफोजी महाराजांना जातो.
त्यांनी सरस्वती महाल लायब्ररीसाठी जगभरातून ४००० पुस्तके विकत आणून ग्रॅंथालय समृद्ध केले. अरबी फारसी भाषेतील पुस्तकांचे अनुवाद केले. ग्रॅंथालयानध्ये अनेक ग्रॅंथासोबतच अनेक नकाशे आणि डिक्शनरी त्यांनी जमवल्या होत्या. १४ भाषा अवगत असणाऱ्या महाराजांनी लायब्ररीमधील सर्व म्हणजे जवळपास ३० हजार पुस्तके अभ्यासली होती. याचा वापर फक्त अभ्यास करण्यासाठी नाही तर जनतेच्या भलाईसाठी देखील केला.
तामिळ, मराठी, तेलगु भाषेतून विपुल वाङ्मयीन रचना सरफोजीराजांनी स्वत: केल्या आणि दरबारी पंडितांकडूनही करून घेतल्या. गोविंदकवी, विरुपाक्षकवी, गंगाधरकवी, अंबाजी पंडित, अवधूतकवी हे त्यांचे दरबारी होते.
सरफोजी महाराज यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते. त्यांनी धन्वंतरी महाल बांधला होता जिथे आयुर्वेद, अलोपेथी, युनानी चिकित्सा पद्धती यावर संशोधन चाले. महाराज स्वतः रुग्णांवर उपचार करीत.
“महाराजांना नेत्रचिकित्से मध्ये विशेष रुची होती. महाराज फक्त औषधोपचार करत नव्हते तर ते शस्त्रक्रिया ही करायचे. साधीसुधी नाही तर मोतीबिंदू वरील शस्त्रक्रिया. १७८२ साली मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेचा शोध फ्रान्समध्ये लागला होता. त्याकाळात भारतामध्ये अतिशय कमी लोकांना या अवघड ऑपरेशनचे ज्ञान होते.”
महाराज सरफोजी त्या पैकी एक. त्यांनी फक्त ऑपरेशन केले नाही तर प्रत्येक ऑपरेशनचे डोक्यूमेंटेशन करून ठेवले. प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांची उपचारापूर्वी आणि उपचारानंतर अशी चित्रे काढून ठेवण्यात आली होती. आपल्या वैदकीय अनुभवावर महाराजांनी शरभेन्द्र वैद्य मुरगळ हा ग्रंथ लिहिला. यात अनेक रोग व त्यावरील उपचार यांचे व्यवस्थित वर्णन करून ठेवले आहे.”
संगीत नृत्य नाट्य चित्रकला या प्रत्येक कलेमध्ये सरफोजी महाराजांनी योगदान दिले. कर्नाटकी शास्त्रीय संगीताला व्हायोलिन आणि सनईची ओळख त्यांनी करून दिली.
कुमारसंभव चम्पू, मुद्राराक्षसछाया ,आणि देवेंद्रकुरुंजी या सारखे संगीतावरील ग्रंथ लिहिले. कर्नाटक संगीताला विकसित कलेचा दर्जा प्राप्त करून देणारे प्रसिद्ध संगीतकार त्यागराज, शामशास्त्री व मुथुस्वामी दीक्षितार हे तिघेही सरफोजींचे दरबारी गायक होते. पाश्चात्य संगीतकारांचे तंजोर बंड त्यांनी उभारले होते. हिंदुस्तानी राग आणि संगीताला पाश्चात्य नोटेशन वर बसवण्याची अभिनव कल्पना सरफोजी महाराजांचीच. कर्नाटकीसंगीत आणि भरतनाट्यमला सुवर्णकाळ त्यांनी मिळवून दिला. भरतनाट्यम मध्येही काही नवीन नृत्यरचना सरफोजी महाराजानी बसवल्या. तंजावर चित्रशैलीचा उगम, प्रसार त्यांनी केला. दरबारासाठी त्यांनी बनवून घेतलेली चित्रे आजही याची साक्ष आहेत.
तमिळ, तेलगु आणि तमिळ या भाषामध्ये अनेक ग्रंथ महाराजांनी स्वतः लिहिले अथवा पंडितांकडून लिहून घेतले. गोविंदकवी, विरुपाक्षकवी,अवधूतकवी हे त्यांच्या दरबारची शान होते...
अशा या मराठा साम्राज्याची सेवा करणार्या आणि मराठी संस्कृती दक्षिणेस रूजवणार्या तंजावरकर भोसले राजघराण्याला मानाचा मुजरा...
संदर्भ - Contributions of Thanjavur Maratha kings - Prince Pratapsinh Sarfojiraje Bhosale.
शिवभारत - स्वामी परमानंद
राजारामचरीतम्
शाहू दप्तर
ताराबाई कालीन कागदपत्रे
Martin's Memories
शिवपुत्र राजाराम












* मराठा सरदार बापू गोखले समाधी.... एक शोध**
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांनी रक्ताचे पाणी करून वाढवलेले , असंख्य मावळ्यांनी आपल्या देहाची लक्तरे करून सांभाळ केलेले हिंदवी स्वराज्य इस सन 1818 रोजी ब्रिटिशांच्या ताब्यात गेले.
बाळाजीपंत नातू या मराठी माणसाने शनिवारवाड्या वरील भगवा ध्वज खाली उतरून त्या ठिकाणी आपल्या हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. शेवटी त्याला त्याचे फळ मिळाले तो तडफडून गंगाजल विना मेला.
असो हा इतिहास सर्वांना माहीत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांच्या मृत्यूनंतरही रक्षण करण्यासाठी अनेक शूर मावळे, सेनापती यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई झाली. इंग्रज व मराठे यांच्यात मोहोळ तालुक्यातील आष्टीत लढाई २० फेब्रुवारी १८१८ रोजी झालेल्या या लढाईला २०० वर्षे पूर्ण झाले१६ नोव्हेंबर १८१७ च्या येरवडा येथील लढाईत निष्क्रिय व उदासीन श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवा यांचा पराभव झाला होता हे अनेकांना माहीत नसावे त्या लढाई मधील असे एक व्यक्तिमत्व की ज्याच्या नशिबी मृत्यूच्या नंतर ही उपेक्षाच आली.मात्र राजा खचला तरी त्यांचे सैन्य व सेनापती मात्र खचले नव्हते. मूठभर सैन्य घेऊन नरवीर बापू गोखले त्यांच्या सोबत होते. या सैन्याचा तळ मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे पडल्यानंतर इंग्रज सैन्य जनरल स्मिथ येथे धडकले. प्रसंग बाका होता. पेशवे अजूनही संभ्रमात व गोंधळलेले होते; मात्र नरवीर बापू गोखले यांनी पेशव्यांना मी एकटाच इंग्रजांना सामोरे जाणार असून, लढताना मरण आले तर बहुमान, याउपर श्रीमंतांचे दर्शन झाले तर उत्तम; अन्यथा हे अंतिम दर्शन असे सांगून जनरल स्मिथच्या सैन्याशी मूठभर मराठे प्राणाची बाजी लावून लढले. घनघोर लढाई झाली.
आष्टीच्या लढाईत मेजर स्मिथ सोबत लढत असताना जखमी अवस्थेतून बापू गोखले बाहेर पडले. अनेक इतिहासकारांच्या मते ते आष्टीच्या लढाईतच धारातीर्थी पडले. पण असे झाले नसावे
त्याची अनेक कारणे संदर्भासहित स्पष्ट करता येतील.
1) जर बापू गोखले आष्टीच्या युद्धामध्ये धारातीर्थी पडले असतील तर त्या ठिकाणी त्यांचे पार्थिव शरीर मिळावयास हवे होते तसे घडताना दिसून येत नाही.
2) जर आष्टीच्या युद्धामध्ये बापू गोखले धारातीर्थी पडले असते तर पुढे सुमारे 25 वर्ष त्यांच्या पत्नीने सौभाग्याचे अलंकार धारण केले नसते. त्यांच्या पत्नीस आपले पती जिवंत आहेत याची जाणीव असावी त्याचबरोबर सरदार बापू गोखले यांची पत्रही जात असावीत पण सध्या तशा प्रकारचे कुठलेही पत्र आपल्याकडे उपलब्ध नाही.
याउलट त्यांनी संन्यास धारण केलेला असावा. असावा म्हणण्यापेक्षा तसे पुरावेही उपलब्ध आहेत
इतिवृत्तांत असा की काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका असलेल्या खरोळा या गावी जाण्याचा योग आला. गावाच्या मध्यभागी अत्यंत सुंदर रेखीव अशा स्वरूपाचे दत्त मंदिर आहे. गावात चौकशी केली असता त्या मंदिरास" बापूची हवेली" असे म्हटले जाते हे कळाले आम्ही ज्यावेळेस मंदिरात पोहोचलो त्यावेळी श्री दत्ताची आरती चालू होती मंदिरामध्ये मंदिरा मध्ये हात-पाय धुवून आम्ही आरतीच्या ठिकाणी पोहोचलो. दत्ताच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी काही पायऱ्या होत्या त्या पायऱ्या चढून आम्ही गाभाऱ्याच्या जवळ पोहोचलो. त्यावेळी मंदिराचे नियुक्त पुजारी दत्ताची आरती करीत होते. बाहेर त्याच संस्थेमध्ये
अध्ययन करणारे विद्यार्थी मधुर स्वरात आरतीला साथ देत होते. आरती संपल्यानंतर मी पुजाऱ्यांचा आशीर्वाद घेतला आणि करावी म्हणून आणि इतिहासाची आवड असल्याने सहज चौकशी केली असता आश्चर्यचकित अशी माहिती समोर आली ती अशी की मुळात श्री दत्त मंदिर नसून मराठ्यांचे शेवटचे सरदार बापू गोखले यांच्या शेवटचे 25 वर्ष राहण्याचे हे ठिकाण किंवा त्यांनी संन्यास धारण केलेला असल्यामुळे त्याला आपण मठ ही म्हणू शकतो. तशी दत्त संप्रदायात किंवा नाथ संप्रदायात ज्या पद्धतीने गादी परंपरा चालू आहे त्याच पद्धतीची गादी परंपरा या ठिकाणी अस्तित्वात होती त्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. तशी गादी पुजाऱ्यांनी आम्हाला दाखवली. त्याचबरोबर त्याच गादीवर दोन महान व्यक्ती जे बापू गोखले यांचे शिष्य असावेत स्वामी सहजानंद सरस्वती व स्वामी परमानंद सरस्वती यांच्या फोटो उपलब्ध आहेत तशा त्यांच्या समाधी ही या मठात उपलब्ध आहेत या तिन्ही समाधी तळघरात असणाऱ्या 10 बाय 10 च्या खोलीत उपलब्ध आहेत. बापू गोखले यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी त्या खोलीत प्रवेश केल्यानंतर एकच लहान खोली मध्ये त्यांची दगडी समाधी दिसून आली.
त्याचबरोबर बाहेरच्या पण बाजूच्या खोलीत स्वामी सहजानंद सरस्वती स्वामी परमानंद सरस्वती यांच्या समाधी आढळून आल्या.
ही वास्तू सुमारे 200 वर्ष प्राचीन असल्याचे पुजाऱ्याची म्हणणे आहे. मी तेथील नियुक्त पुजाऱ्यांना सरदार बापू गोखले यांच्या वास्तव्याचे काही पुरावे आहेत का असे विचारले असता त्यांनी आता मला थोडे काम आहे तुम्ही निवांत मध्ये आलात तर मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवीन असे आश्वासन दिले. याच दत्त मंदिराच्या बाजूस श्री विनायकाचे अतिशय सुंदर पण उघड्यावरचे छोटेसे मंदिर आहे. हा श्री विनायक पाहता काय कारण आहे माहित नाही पण अचानक डोळ्यासमोर पेशवे काळ उभा राहिला कारण पेशव्यांच्या काळात श्री गणेशाची अनेक ठिकाणी स्थापना केल्याचे आढळून येते. याच बाजूला थोडे पुढे गेल्यावर श्री शंकराचे अतिशय सुंदर, दगडी ,गावकर यांच्या म्हणण्यानुसार राक्षसी बांधकाम आहे. ज्यास आपण हेमांडपंथी असे म्हणतो. मंदिरातील नंदी हा अतिशय सुंदर असून शिव पिंड ही अत्यंत सुरेख अशी आहे. सोबत या मंदिराच्या परिसरात घेतलेल्या काही फोटो आहेत.
आता या मठासाठी ट्रस्टची स्थापना झाली असून रेणापुर चे तहसीलदार या मठाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
या मंदिराचे पुजारी गत 12 वर्षांपासून सेवेत आहेत.
या ठिकाणाला भेट द्यावयाचे असल्यास आष्टामोड पासून हे ठिकाण केवळ 10 किमी. तसेच रेणापूर पासून 10 ते 12 किलो किलोमीटर एवढे आहे.
इतिहासात अजरामर असणाऱ्या आणि मराठा अँग्लो युद्धात प्राणाची शर्थ करणाऱ्या आणि मृत्यूनंतरही उपेक्षा सहन करणाऱ्या या महान मराठा सरदारास शतशः नमन


ऐहोळे येथील सर्वात उंचावर असलेले मंदिर म्हणजे मेगुती मंदिर. हे रूपांतरीत जैन असावे की हिंदू मंदिर याबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. कारण मंदिराच्या बाह्यांगावरील खुणा बघता कोणे एकेकाळी हे हिंदू मंदिर असल्याचे जाणवते. आतमध्ये मात्र भगवान महावीर यांची मुर्ती विराजमान आहे. शिवाय मंदिर परीसरातील उत्खननात देखील एक अप्रतिम जैन देवीची(अंबिका) प्रतिमा सापडली जी सध्या ऐहोळे येथीलच संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतिहास प्रसिद्ध ऐहोळे प्रशस्ती किंवा ऐहोळचा चालुक्य नरेश पुलकेशीन द्वितीय यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा शिलालेख (इ.स.६३४) याच मंदिराच्या पूर्वेकडील भिंतीवर आजही पहायला मिळतो.










आपल्या पराक्रमाच्या कर्तुत्वा सोबतच शेतकऱ्यांसाठी धरणे बांधणारे मराठे सरदार !!!!!
जंगबहाद्दर इंगळे घराणे प्रथम तीन शिलालेख प्रकाशित
श्रीमंत अलिजाबहादर महादजीबाबांचा उजवा हात सरदार अंबूजीराव इंगळे घराणे शिलालेख
चाकण तळेगाव रोड वर मुख्य रस्त्यालगत म्हाळुंगे इंगळे हे गाव आहे .
औद्योगीक करणामुळे सध्या विस्तारित झालेले हे गाव तस जुने आहे या गावाला मोठा इतिहास आहे .गावाची मुख्य कमान वेश ,गावातील जुनी मंदिरे तेथील विहरी ,बारवा तळी धरणे ,गावकोस संपूर्ण वेश ,वीर सरदारांच्या समाध्या याच्या अस्तीत्वाच्या खुणा आजही गावात पाहायला मिळतात,या गावचे मूळ रहिवासी राजेश्री सरदार राघोजी इंगळे यांचे गाव त्याच्या पुढील पिढ्यांनी स्वराज्याची सेवा करत पराक्रम गाजवला .त्या पैकी वंश् परंपरेने मूळ थोरले वंशज अंबुजी इंगळे यांचे पुत्र त्रिंबकजी इंगळे यांचा पुत्र मावजी यांच्याकडे म्हाळुंगे इंगळे गावची पाटीलकी होती .त्यांनी गावहिताची खूप सारी विधायक कार्य केलेली आहेत .सध्या त्यांचे पुढील पिढीतील मूळ शाखेचे थेट वंशज इनामदार श्री भगवंत राव इंगळे व त्यांचे पुत्र श्री सुरेंद्र इंगळे .सध्या म्हाळुंगे इंगळे येथे राहतात .आजही त्यांचा गावात जुना वाडा आहे .आजही त्यांच्या कडे घराण्याची जुनी वंशावळ,मोडी कागदपत्रे ,घराण्याचा मूळ शिक्का ,व कट्यार व काही नाणी , उपलब्द आहेत आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसा त्यांची पुढील पिढी जपताना दिसत आहे ..
म्हाळुंगे शिलालेख क्रमाक. १
हा शिलालेख पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील चाकण जवळ असलेल्या मौजे : महाळुंगे इंगळे गावातील गावाच्या मुख्य वेशीशेजारी असलेल्या चौरसाकृती बारवेवर पायऱ्या उतरताना उजव्या बाजूस आहे शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ७ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.
गावाचे नाव : महाळुंगे इंगळे
ता.खेड , जि. पुणे
शिलालेखाचे वाचन :
१ श्री गणेशायनमः
२ श्री सके १६९९ हेमलंबी नाम
३ सवत्सरे चै.शुद्ध १ तळे बांधले त्री
४ बंकजी बिन मावजी पाटील मोका
५ दम इंगळे मौजे म्हाळुंग ता. चाक
६ ण येकदर रू २१००१ येकवीस हा
७ जार येक यासीवाय कारागीरास बक्षीस
जी.पी.एस. :१८ ४५” ३२’ १ ,७३ ४८’’२१’ ९
शिलालेखाचे स्थान : बारवेच्या पायरया उतरताना उजव्या बाजूस वरती आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : पिण्याच्या पाण्याकरिता तळे बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : अठरावे शतक - शके १६९९ हेमलंबी नाम संवस्तरे चैत्र शुद्ध प्रतिपदा १ (गुढीपाडवा) मंगळवार
काळ वर्ष : अठरावे शतक ८ एप्रिल १७७७
कारकीर्द :छ. धाकटे शाहू महाराज . पेशवेपद - सवाई माधवराव पेशवे
व्यक्तिनाम : राजेश्री त्रिंबकजी ,मावजी पाटील
ग्रामनाम :-मौजे : महाळुंगे इंगळे,चाकण
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे
प्रकाशक :
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६९९ व्या वर्षी हेमलंबी नाम संवत्सरातील चैत्र शुद्ध प्रतिपदा १ म्हणजे गुढीपाडवा म्हणजेच मंगळवार ८ एप्रिल १७७७ या दिवशी सरदार राजेश्री मावजी पाटील इंगळे यांचे पुत्र राजेश्री त्रिंबकजी पाटील जे चाकण परगण्यातील मौजे : महाळुंगे इंगळे या गावाचे मोकदम असून त्यांनी २१००१ एकवीस हजार एक रुपये खर्च करून या शिवाय काही रक्कम तळ्याचे बांधकाम करणाऱ्या कारागिरास बक्षीस देवून गावा मध्ये एक पिण्याच्या पाण्याचा तलाव बांधला , किवां तलावाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात किंवा ते काम पूर्ण झाले.
संक्षेप :- येकदर-एकंदर ता .तर्फ
संदर्भ -(IE VI -356 )
म्हाळुंगे शिलालेख क्रमाक. २
हा शिलालेख पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील चाकण जवळ असलेल्या मौजे : महाळुंगे इंगळे गावातील गावाच्या वेशीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या इंगळे घराणे यांची कुळदेवता काळकुबाई मंदिराशेजारी असलेल्या धरण बंधाराच्या भिंतीवर आहे ,शिलालेख झाडा झुडूपा विळख्यात असून वेलीने माखलेला आहे लगेच दिसत नाही शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ६ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत
गावाचे नाव : : महाळुंगे इंगळे
ता.खेड , जि. पुणे
शिलालेखाचे वाचन :
१ श्री चेरणी तत्पर त्रींबकजी
२ व सटवाजी पाटील बीन मां
३ वजी पाटील इंगळे मो
४ दम मौजे महाळुं
५ गे धर्रना माती करता
६ रुपये लागले ३०००
जी.पी.एस. :१८ ७६ ” ७७ ’ ०७ ,७३ ७९ ’’२६ ’ ५५
शिलालेखाचे स्थान : धरण भिंतिच्या मध्यभागी वरील बाजूस आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : पिण्याच्या पाण्याकरिता धरण ,तळे बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : अठरावे शतक - शके १७२४ आसपास कालावधी असावा त्यांच्या घराणेच एक पत्र उपलब्ध आहे त्यात या विहरीच्या बांधकामाचा उल्लेख आहे.
काळ वर्ष : अठरावे शतक सन १८०२आसपास
कारकीर्द : छ.धाकटे शाहू महाराज.पेशवेपद - सवाई माधवराव पेशवे
व्यक्तिनाम : राजेश्री त्रिंबकजी राजेश्री,मावजी पाटील इंगळे
ग्रामनाम :-मौजे : महाळुंगे इंगळे
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे
प्रकाशक :
अर्थ :
सरदार राजेश्री मावजी पाटील इंगळे यांचे पुत्र राजेश्री त्रिंबकजी पाटील जे चाकण परगण्यातील मौजे म्हाळुंगे या गावाचे मोकदम असून त्यांनी ३००० तीन हजार रुपये खर्च करून मातीचे धरण बांधले धरणाची भिंती करता दगड व माती साठी एकदर खर्च ३००० हजार रुपये लागला किंवा धरणाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात किंवा ते काम पूर्ण झाले.
संक्षेप :- धर्रना-धरण
म्हाळुंगे शिलालेख क्रमाक. ३
हा शिलालेख पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील चाकण जवळ असलेल्या मौजे म्हाळुंगे गावातील गावाच्या वेशीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या इंगळे घराणे याच्या ग्राम देवता पानहाली आई मंदिराशेजारी असलेल्या धरण बंधाराच्या भिंतीवर मध्यभागी वरच्या बाजूस आहे धरण भिंत रेखीव दगडात असून भिंतीला बुरुज बांधले आहेत भिंत आजही मजबूत आहे ,शिलालेख झाडा झुडूपा विळख्यात असून वेलीने माखलेला लगेच दिसत नाही. शिलालेख खोदीव स्वरूपाचा असून ६ ओळीचा असून शुद्ध मराठी भाषेत आहे काळाच्या ओघात शिलालेखाची अक्षरे झिजलेली असून पुसट झालेली आहेत.
गावाचे नाव : : महाळुंगे इंगळे ता.खेड जि. पुणे
शिलालेखाचे वाचन :
१ श्री चेरनी तत्पर शके १७०१ विकारीनाम
२ सवतसरे वैशाख शुद्ध १ त्रिबकजी बीन
३ मावजी पाटील इंगळे मौजे म्हाळूण
४ . गे..राजश्री .महादजी विठ्ठल फडणवीस ..
५.यातून पाणवठा आणि तलाव पूर्ण
6 झाले येकदर रुपये लागले..३१००
जी.पी.एस. :१८ ७४ ” ९९ ’ ३४ ,७३ ८१ ’’३७ ’ ८३
शिलालेखाचे स्थान : धरण भिंतिच्या मध्यभागी वरील बाजूस आहे
अक्षरपद्धती : कोरीव स्वरूपाचा लेख आहे.
भाषा : शुद्ध मराठी देवनागरी
प्रयोजन : पिण्याच्या पाण्याकरिता धरण तळे बांधल्याची / बांधकामाची स्मृती जपणे.
मिती / वर्ष : अठरावे शतक - शके १७०१ विकारी नाम संवत्सरे वैशाख शुद्ध १
काळ वर्ष : अठरावे शतक रविवार १६ मे १७७९
कारकीर्द : छ.धाकटे शाहू महाराज पेशवेपद - सवाई माधवराव पेशवे
व्यक्तिनाम : राजेश्री त्रिंबकजी , राजेश्री मावजी पाटील इंगळे ,राजश्री महादजी विठल फडणवीस
ग्रामनाम :-मौजे महाळुंगे ,
शिलालेखाचे वाचक : श्री. अनिल किसन दुधाणे
अर्थ : शालिवाहन शकाच्या १७०१ व्या वर्षी विकारी नाम संवत्सरातील वैशाख शुद्ध १ म्हणजेच रविवार १६ मे १७७९ या दिवशी धरणाच्या जीर्णोद्धाराला सुरुवात किंवा ते काम पूर्ण झाले.
सरदार राजेश्री मावजी पाटील इंगळे यांचे पुत्र राजेश्री त्रिंबकजी पाटील जे चाकण परगण्यातील मौजे म्हाळुंगे या गावाचे मोकदम असून त्यांनी ३१०० तीन हजार शंभर रुपये खर्च करून महादजी विठ्ठल कि जे फडणीस होते त्यांचे अख्तेरीत मातीचे धरण बांधले ,धरणाची भिंती करता दगड व माती साठी एकदर खर्च ३१०० रुपये लागला .
संक्षेप :- म्हाळूणगे :-महाळुंगे, येकदर-एकंदर, चेरनी-चरणी
संदर्भ :- IE VI -३६०
वरील सर्व शिलालेख महत्व.
म्हाळुंगे इंगळे हे गाव.चाकण तळेगाव रोड वरील महत्वाचे गाव आहे.चाकण परगण्यातील सरदार आंबुजी इंगळे हे मोकदम पाटील होते.चाकण परगण्यातील काही गावांची पाटीलकी त्यांच्याकडे होती .जवळच देहू गाव असल्यामुळे त्या गावाचे आध्यात्मिक व धार्मिक महत्व ही मोठे होते.त्यांनी देहू गावची पाटीलकी विकत घेतली होती.तसपत्र उपलब्ध आहेत .
म्हाळुंगे इंगळे हे गाव पूर्वी गावापासून बाहेर 1किमी अंतरावर स्थायिक होते आजही त्यांच्या खुणा मंदिरे काही घरे स्वरुपात तेथे आहेत .गाव हद्दीतील शेतीकरिता व पिण्याची पाणी सोयिकरिता राजेश्री त्रिंबकजी इंगळे त्यांचे पुत्र मावजी व सटवाजी इंगळे या भावांनी शके १६९९ साली बारव व१७०१ ,१७२४ साली दोन धरणे बांधून प्रत्यक्ष २१००१ ,३१०० ,व ३००० रूपये सारखा मोठा आर्थिक खर्च करून धरणे तलाव, विहीरीं, वेशी, मंदीरे गावकोस,एक जन हिताचे मोठे सामाजिक व आध्यत्मिक कार्य केले आहे.या पाण्यावरच म्हाळुंगे इंगळे गावचे सुपीकत्व अवलंबून होते.
उत्तर मराठे शाहीच्या कारकिर्दीतील नारायणगाव येथेएक धरण बांधलेले नोंद आहे.त्याच प्रमाणे म्हाळुंगेइंगळे गावात सरदार इंगळे यांनी धरणे बांधून एक लोक हिताचे चांगले सत्कृत्य ,केलेले आहे यावरून त्यांचे समाजाबद्दल असलेले सामाजिक भान ,प्रेम स्नेह आपुलकी .आणि समाज्या बद्दलची भविष्यातील दूरदृष्टी त्यांनी शिलालेख स्वरुपात समाजासमोर कोरून ठेवणे हेच या शिलालेख चे महत्व अधोरेखित करते
इंगळे घराण्याचा इतिहास :-
जंग बहाद्दर सरदार इंगळे घराणे
प्रसाद शिंदे यांच्या आभ्यास नुसार
---------------------------------------------
१) सरदार इंगळे घराणे शिवपूर्व काळापासूनच एक मातब्बर घराणे म्हणून प्रसिद्ध होते.सरदार इंगळे घराणे हे मूळचे बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यातील करवंड गावचे.करवंड गावी इंगळे घराण्याची भव्य गढी असून सध्या भग्नावस्थेत आहे.इंगळे घराण्याचे नातेसंबंध थेट भोसले घराण्याशी होते.इंगळे घराण्यातील गुणवंताबाईसाहेब या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राणीसरकार होत्या तसेच तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांचा विवाह इंगळे घराण्यातील दिपाबाईसाहेब यांच्याशी झाला होता.आदिलशाही दरबारातील एक वजनदार घराणे म्हणून सरदार इंगळेंची कीर्ती सर्वदूर होती.इंगळे घराण्याला जंगबहाद्दर हा किताब आहे.स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या सोबत राहून या घराण्याने बरीच तलवार गाजवली.
२) सरदार शिवाजीराव इंगळे,सरदार बहिरजी नाईक इंगळे हे प्रमुख सरदार स्वराज्यसेवेत होते.प्रतापगडच्या युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाशी भेट घेण्याचे ठरविले तेव्हा काही निवडक मातब्बर मंडळींसोबत सरदार कात्याजीराव इंगळे यांना आपल्यासोबत घेतले.
३) छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या कालखंडात स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रूपांतर झाले.स्वराज्य विस्तारासाठी हि इंगळे मंडळी महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी आपल्या तलवारीच्या जोरावर सरंजाम मिळवून स्थायिक झाली.दक्षिणेत तंजावर या ठिकाणी स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसलें सोबत सरदार इंगळेंची एक शाखा होती.तसेच पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे-इंगळे,बेलसर नजीक निळुंज-वाळुंज परिसर,कोल्हापूर,ग्वाल्हेर,उज्जैन मध्ये सरदार इंगळे घराण्याच्या शाखा सध्या वास्तव्यास आहेत.
४) मराठा साम्राज्याचा उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणाऱ्या शिंदे सरकार घराण्याच्या पदरी राहून इंगळेंनी मोठी कीर्ती मिळवली.शिंदेशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे यांच्या समवेत राहून सरदार सुभानजीराव इंगळे,सरदार त्रिंबकजीराव इंगळे हे अनेक मोहिमेत सहभागी होते.सरदार त्रिंबकराव इंगळे यांना त्यांचे पराक्रमी पुत्र सरदार अंबुजीराव इंगळे यांची बहुमूल्य साथ मिळाली.
५) महापराक्रमी श्रीमंत सुभेदार जयाप्पाराव शिंदे व वडील सरदार त्रिंबकजीराव इंगळे यांच्या सावलीत राहून राजश्री अंबूजीबाबा चांगलेच तरबेज झाले होते.पानिपत युद्धानंतर श्रीमंत महादजीबाबांनी सैन्याचे मजबूत संघटन केले व सरदार अंबुजीराव इंगळे यांच्यावर सेनापती पदाची जबाबदारी टाकली.राजश्री अंबुजीबाबा यांनी श्रीमंत पाटीलबाबांच्या मागे सरदार इंगळे घराण्यातील मातब्बर वीरांची फौज एखाद्या मजबूत तटबंदी सारखी उभी केली.यामध्ये सरदार खंडोजीराव इंगळे,बाळोजीराव इंगळे,मालोजीराव इंगळे,पांडोजीराव उर्फ विठोजीराव इंगळे या सख्या बंधुसोबत बाबाजीराव इंगळे,तिलकराव इंगळे,शामराव इंगळे,शक्तीराव इंगळे,जीवजीराव इंगळे,लक्ष्मणराव इंगळे यांचा समावेश होता.
६) सरदार अंबुजीराव इंगळे यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले.गोहदवर विजय मिळविल्यानंतर या राज्याची व्यवस्था अंबुजीरावांनी योग्यरितीने लावून दिली. राघोगढ,करोली संस्थान चौथ देण्यास मनाई करत असताना आपल्या दराऱ्याच्या जोरावर चौथवसुली केली.राघोगढच्या राजावर जाता-येता चांगलीच वचक ठेवली.अंबुजीरावांचा धसका घेऊन राघोगढवाल्यांनी पुढे चौथ वेळेवर देण्याचे मान्य केले.श्रीमंत महादजीबाबांनी दिल्लीच्या बादशहासोबत मसलत करण्याची जबाबदारी अंबुजीरावांवर सोपल्यावर त्यांनी आपल्या हुशारीची चुणूक दाखवून मराठ्यांचा मनसुबा बादशहाच्या चांगलाच गळी उतरवला.
मराठा व शिख यांच्यात झालेल्या तहाची अंबलबजावणी करण्याची जबाबदारी जंगबहाद्दर अंबुजीरावांच्या खांद्यावर सोपवली.सोबतच शिखांच्या राज्याला लागून असलेल्या सोनपतच्या २८ महालांवर फौजदार म्हणून नियुक्त केले.याच मोहिमेदरम्यान अंबुजीरावांची धाडसी व आक्रमकवृत्ती त्यांनी पाटीलबाबांना लिहलेल्या एका पत्रातून दिसून येते त्यापत्रातील मजकूर थोडक्यात असा की,"शिखांचा जमाव भरपूर आहे परंतु सगळ्यांचे काही एकमत नाही त्यात बरेच फितुर लोकही आहेत.लाहोरकडील शिख व पानिपत कडील शिख हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत.पानिपतकडील शिखांनी लाहोरच्या शिखांचे मिळून पारिपत्य करण्याचा प्रस्ताव पाठविला असून आम्ही त्यांचा बंदोबस्त करू."यावर पाटीलबाबांनी दगाबाजीची शक्यता वर्तवून संयम राखण्याचा सल्ला दिला आहे.
शिखांच्या अफाट जमावात शिरून त्यांचा बिमोड करण्याचे धाडस अंबूजीरावांसारखा रणबहाद्दरच करू शकतो.पुढे अंबुजीरावांनी आपल्या मुत्सद्देगिरीने शिखांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले याचा फायदा पुढे मराठा साम्राज्याला चांगलाच झाला.
श्रीमंत महादजीबाबाबांनी पुण्यात येण्याअगोदर राजपुतान्याची जबाबदारी अंबूजीरावांवर सोपवली. शिंद्याची राजधानी असलेल्या उज्जैन,ग्वाल्हेरच्या संरक्षणाची जबाबदारी वेळोवेळी चोख बजावली. राजपुतान्यातून चौथ वसुली असो वा उत्तरेतील महत्त्वाचे राजकारण असो अंबूजीराव सदैव अग्रस्थानी राहिले. श्रीमंत महादजीबाबांचा उजवा हात अंबूजीरावांना म्हंटल तर काही अतिशयोक्ती होणार नाही.शिंदे सरकारांच्या पत्रव्यवहारात अंबुजीरावांच्या बद्दल असे लिहले आहे की,"अंबुजी माणूस फार कामाचा,सेवेयोग्य आहे.स्वरूप जवळ असल्यासच ध्यानात येईल."या दोन ओळीच अंबूजीरावांचे शिंदेशाहीतील महत्व अधोरेखित करतात.
उत्तरेतील राजकारणात व्यस्त असून सुद्धा अंबूजीरावांची आपल्या पुण्यातील चाकण जवळील म्हाळुंगे या गावाशी नाळ तुटली नाही.गावशीवेचा व कुरणाचा वाद लवकरात लवकर निकालात काढावा यासाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.अंबुजीरावांनी मौजे देहू गावाची पाटीलकी विकत घेतली होती.
श्रीमंत दौलतराव शिंदे यांच्या कार्यकाळात ८०-८५ वय असताना सुद्धा अंबूजीरावांनी मराठा साम्राज्याची सेवा केली.१८०९ साली श्रीमंत महादजीबाबांच्या या निष्ठावंत सहकाऱ्याने अखेरचा श्वास घेतला.पुढे त्यांचे पुत्र त्रिंबकराव व बंधूनी शिंदे सरकारांची निष्ठेने सेवा केली.
ग्वाल्हेर व उज्जैन या ठिकाणी अंबुजीरावांचे वंशज हल्ली वास्तव्यास आहेत.ग्वाल्हेर या ठिकाणी अंबुजीरावांचे बंधु बाळोजीराव इंगळे यांचा वंशविस्तार झाला असून त्यांना राई हा महाल इनाम असल्यामुळे राईवाले इंगळे म्हणून ओळख आहे.श्रीमंत महाराजा दौलतराव शिंदे यांनी ग्वाल्हेरमध्ये लष्कर म्हणून एक नगर वसवले तेव्हा आपल्या निवासासाठी गोरखीमहाल म्हणून एक महाल बांधला.त्याची पुढे ओळख महाराजावाडा म्हणुन झाली.त्याच कडेने पुढे ग्वाल्हेरच्या सरदारांनी आपले वाडे बांधले.सरदार इंगळे यांनी दालबाजार या ठिकाणी आपला वाडा बांधला.पुढे वंशविस्तारामुळे ग्वाल्हेरमधील अनेक ठिकाणी सध्या इंगळे मंडळी वाडे बांधून वास्तव्यास आहेत.
मराठा साम्राज्याची अविरतपणे सेवा करणाऱ्या शिंदेशाहीतील निष्ठावंत सरदार इंगळे घराण्याच्या चरणी सदैव नतमस्तक.
©अनिल दुधाणे
धन्यवाद पत्रकार .मयूर भावे,निलेश शेंडे
टीप :- सदर संशोधन कार्यात म्हाळुंगे इंगळे गावाचे श्री भगवंत साहेबराव पाटील इंगळे इनामदार व त्यांचा मुलगा श्री .सुरेंद्र इंगळे,तसेच श्री प्रवीण भोसले ,प्रसाद शिंदे यांची मोलाचे सहकार्य व मदत झाली .
अधिक माहितीसाठी संपर्क :- सुरेंद्र इंगळे -९८५०८२२७६७
प्रशांत इंगळे -९५९५९९४५४५



राजा जयचंद्र आणि अपप्रचार
इतिहासात एखादा व्यक्ती नायक पदाला प्राप्त झाला की त्याचे दोष, चुका, अपराध हेतुपुरस्सर दुर्लक्षित केले जाऊन इतिहास व्यक्तिनिष्ठ होतो. त्यामुळे कुठल्याही इतिहासाचा अभ्यास हा एकपक्षीय विचार न करता वस्तुनिष्ठपणे साधार आणि पुरावे लक्षात घेऊन करायला हवा.
काश्मीरचे अमात्य चंपक यांचे चिरंजीव आणि काश्मीरच्या इतिहासाचे लेखक कल्हणपंडित राजतरंगिणीत म्हणतात त्याप्रमाणे श्री श्लाघ्य: स एव गुणवान रागद्वेषबहिष्कृता । भुतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती ।। म्हणजे जो मनुष्य राग, लोभ, द्वेष बाजूला ठेवून (इतिहासातील) जशी असेल तशी वस्तुस्थिती कथन करतो, तो मनुष्य प्रशंसनीय होय.
इतिहासात बरेचदा नायकही चुका करतात आणि त्यामुळे दुर्जन लोकांप्रमाणे सज्जन लोकांशीही त्यांचे वैर उद्भवते. याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चौहान आणि जयचंद गाहडवाल.
ख्रिस्ताब्द ११९१ मध्ये तराईच्या पहिल्या युद्धात मिळालेल्या विजयाने हुरळून जाऊन पृथ्वीराज स्वतःस अजेय समजू लागला. त्याने आपले सार्वभौमत्व सिद्ध करायला वेगवेगळ्या प्रदेशांवर हल्ले करायला आपल्या सैन्यास रवाना केले. यातच त्याचा सेनापती स्कंद गंगेच्या खोऱ्यात ससैन्य येऊन धडकला जिथे त्याची गाठ गाहडवाल सैन्याशी पडली. उपलब्ध स्रोतांच्या आधारावर असे म्हणता येईल की कदाचित् हीच या सैन्याची समोरासमोर प्रत्यक्षपणे येण्याची पहिली वेळ. यापूर्वी चौहान आणि गाहडवाल यांच्यात वैमनस्य दिसत नाही.
यावेळी काशी/कन्नौजवर गाहडवाल राजा जयचंद राज्य करीत होता जो स्वतः धर्मनिष्ठ, शूर, वीर आणि विद्वान गुणीजनांचा आश्रयदाता म्हणून विख्यात होता. जयचंदाने स्वतःहून पृथ्वीराजाविरुद्ध पाऊल उचलले नव्हते. उलटपक्षी पृथ्वीराजाच्या सैन्याने त्याच्या राज्यात नासधूस, लुटपाट केली होती ज्यामुळे दोष जयचंदास जात नाही.
याच विरोधामुळे त्याने तराईच्या ख्रिस्ताब्द ११९३ च्या दुसऱ्या युद्धामध्ये पृथ्वीराजास सहाय्य केले नाही. पण महत्वाची गोष्ट ही की तो शहाबुद्दीन मुहम्मद घोरीलाही सामील झाला नाही, घोरीस त्याने कुठलेच सहकार्य केले नाही. तो तटस्थ होता. किंबहुना पृथ्वीराजाच्या नंतर जयचंद गाहडवालानेसुद्धा घोरीस झुंज दिली. घोरीच्या ख्रिस्ताब्द ११९४ मध्ये केलेल्या स्वारीत राजा जयचंदाने त्यास प्रतिकार करत चंदावरच्या लढाईत वीरमरण पत्करले.
काही इतिहासकार पृथ्वीराजाने संयोगिता/तिलोत्तमा/कांतीमयी नामक जयचंदाची कन्या तराईच्या पहिल्या युद्धानंतर पळवून नेली आणि तिच्याशी विवाह केला असे म्हणतात. पण पृथ्वीराज याकाळी भटींड्यास १३ महिने वेढा घालून बसलेला असताना तो असे अपहरण करणे शक्यच नाही. शिवाय या नावाची कुठलीही कन्या जयचंदास नसल्याने ही कथा काल्पनिक असण्याची दाट शक्यता आहे.
संयोगितेच्या कथेचा उदोउदो करणाऱ्या पृथ्वीराज रासोत राजा जयचंदास राठौड म्हटले आहे. मुळात राठौड हे चंद्रवंशीय राष्ट्रकूट जे उत्तरेत बदायुन, हाथुंडी वगैरे ठिकाणी स्थायिक झाले. पण जयचंद हा वास्तविक सूर्यवंशीय गाहडवाल राजपूत होता ज्यांचा राठौड वंशाशी वांशिक संबंध नव्हता. इतकेच नाही तर जयचंदाचे पितामह गोविंदचंद्र गाहडवाल यांची एक राणी राठौड कुळातील होती आणि या वैवाहिक संबंधांवरून स्पष्ट होते की ही दोन्ही कुळे भिन्न होती. उत्तर काळात रचलेले कपोलकल्पित आणि चमत्कारिक कथांनी भरलेले पृथ्वीराज रासो विश्वसनीय नसल्याने त्याला इतिहासाच्या अभ्यासासाठी ग्राह्य धरणे घातक आहे.
जयचंद्राची प्रतिमा वास्तविकरित्या कुणी मलिन केली असेल तर ती ऐन-ए-अकबरीत मुघलांचा लेखक अबुल फजल याने. अबुल फजलला इस्लामचा विजय तर दाखवायचा होता परंतु पृथ्वीराजासारख्या राजपुतांमध्ये लोकप्रिय तथा शौर्याचे प्रतीक असलेल्या राजाविरुद्ध तो दाखवू शकत नव्हता या कारणाने त्याने कुठल्याही पुराव्यांच्या आधाराशिवाय जयचंद्रास फितूर आणि दोषी म्हणून ग्रंथात प्रस्तुत केले आणि त्याची प्रतिमा कलुषित करून ठेवली.
ख्रिस्ताब्द ११९४ मध्ये राजा जयचंद मारला गेल्यावर त्याचा मुलगा हरिश्चंद्र घोरीचा मांडलिक म्हणून राज्य करू लागला पण पुढे त्याने संधी बघून हे परकीय वर्चस्व झुगारून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पदरी अपयश आले आणि कुतुबुद्दीन ऐबकाने त्याचा अंत केला.
देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका शूरवीर आणि धर्मपरायण राजाला इतिहासात असे कलंकित करून निंदेचा विषय बनवणे म्हणजे आपल्या मातृभूमीसाठी झिजणाऱ्या वीरांच्या गौरवमय इतिहासाचे विडंबन नाही तर काय म्हणावे ?
स्रोत आणि अतिरिक्त माहितीसाठी
◆ जयानक कृत पृथ्वीराजविजय
◆ चंद बरदाई कृत पृथ्वीराज रासो
◆ मिनहाज सिराज कृत तबकात-ए-नासिरी
◆ अबुल फजल कृत ऐन-ए-अकबरी
- शुभम् जयंत सरनाईक


इतिहास हा घटनांची जंत्री म्हणून शाळेत शिकवला जातो, म्हणून तो रुचत नाही. तोच एक रंजक कथा म्हणून पाहाल तर रुचकर वाटतो.
बरं, एकच कथा असते का? एकाच कथेत किती कथा गुंफलेल्या असतात. म्हणजे एका देशात, कित्तीतरी लोकांची, त्यांच्या पिढ्यांची, पिढ्यांतील प्रत्येकाची एक वेगळी कथा असते. तुमची एक कथा आहे, तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येकाची एक निराळी कथा आहे. अशा कितीतरी कथांचा एक जंजाळ जेंव्हा काहीशे वर्ष पार करतों, त्यातून समाजाची एक कथा तयार होते, जसे गुप्त साम्राज्य, सिंधू कालीन, इजिप्तची संस्कृती. अशा विविध काळात घडलेल्या अनेक संस्कृतींच्या कथा मिळून एक देशाची कथा बनते, अशा अनेक देशांच्या कथा बनून एका जगाची कथा बनते. अशा कथाही प्रत्येक काही पिढ्यांनी वळण घेतात.
अशा काही कालखंडाच्या कथा बनतात तेंव्हा देशाची आणि जगाची एक कथा बनते.
त्यामुळे इतिहास जंत्री नाहीच आणि केवळ कथाही नाही, इतिहास कथांचे एक महाजाल आहे. पण, या कथा नुसत्या घडायच्या म्हणून घडत नाहीत. त्यामागे काहीतरी एक विचार असतो. तुम्हीही असा विचार केलात तर तो विचार नक्की कोण करतो हा प्रश्न पडेल. कुणी त्याला देव म्हणेल, कुणी नियती, कुणी प्रारब्ध.. पण, प्रत्येक कथेमागे, आणि तुमच्या कथेशी जोडलेल्या प्रत्येक माणसामागे ही एक विचार आहे. तीच माणसे एकत्र का येतात.
असाच विचार देशाबाबतीत होतो. भारताची सातहजार वर्षांची कथा, त्याच कलखंडातल्या भारताला समकालीन असणाऱ्या इराक, पर्शिया आणि इजिप्तपेक्षा निराळी आहे. आज ईजिप्तकडे मागच्या तीन हजार वर्षाच्या कथेतून पाहिलं तर वेगळाच अनुभव मिळतो, तो भारतापाशी वेगळा आहे, इराकची कथा भिन्न, अमेरिकेची, युरोपची प्रत्येकाची कथा भिन्न.
पण, त्या प्रत्येक देशाच्या कथेच्या प्रवाहात एक समान सूत्र आढळते. तेच आहे त्या देशाचे कॅरेक्टर- चारित्र्य. भारताचेही स्वतःचे चारित्र्य आहे. हेच भारत पुस्तकाच्या पहिल्या खंडाचे शेवटचं प्रकरण आहे.
पण, मला सांगायचंय वेगळं. मला असं वाटतं की माणसाचा इतिहास म्हणजे एक फार मोठं तत्त्वज्ञान आहे. त्यातील घडणाऱ्या कथा म्हणजे फक्त एक बाय प्रॉडक्ट आहे. मूळ आहे ते तत्त्वज्ञान. जे तुमचं चारित्र्य घडवतं...
या मानवाच्या अस्तित्वाचे तत्त्वज्ञान समजले, की इतिहासातील घटनांचा अर्थही लागतो, आणि भविष्यातील घटनाही कळतात. पण त्याहीपेक्षा या तत्त्वज्ञानाचा अभ्यास गरजेचा आहे, भविष्य कसे घडवायचे आहे हे समजण्यासाठी.
इतिहासाचा अभ्यास करायचा , इतिहासातील तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी. तेच मध्यभागी आहे. तोच लसावी आहे. त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या कथा केवळ निमित्त आहेत, ते तत्त्वज्ञान पुढे घेउन जाण्यासाठी...
हर्षद माने....


छत्रपती राजाराम महाराज यांनी आपल्या सरदारांना दिलेल्या पदव्या / पद आणि किताब -
संताजी घोरपडे -( सरसेनापती ) ममलकतमदार
धनाजी जाधव - ( सरसेनापती ) जयसिंगराव
बहिर्जी घोरपडे - हिंदूराव
मालोजी घोरपडे - आमिर अल उमराव
विठोजी चव्हाण - हिंमतबहाद्दर
रामचंद्र पंत - हुकुमतपन्हा
परसोजी भोसले - सेनासाहेबसुभा. सन्मान सेनापती प्रमाणे वस्त्रे व जरीपटका.
सिदोजी निंबाळकर - सरलष्कर. सन्मान सेनापती प्रमाणे वस्त्रे व जरीपटका सोबत चौघडा.
प्रल्हाद निराजी - प्रतिनिधी पद.
निळो मोरेश्वर पिंगळे - मुख्य प्रधान.
रघुनाथराव तिमाजी हणमंते - अमात्य ( जिंजी मुक्कामी )
संक्राजी मल्हार नरगुंदकर - सचिव
निराजी रावजी - न्यायाधीश
खंडेराव दाभाडे - सेनाधुरंदर. सन्मान सेनापती प्रमाणे.
खंडो बल्लाळ - चिटणीस.
अंताजी मंगाजी व गंगो मंगाजी - वाकनिशी व पोतदारी .
बाबजी निळो - पारसनीस.
आनंदराव महादेव व त्रिंबकराव महादेव - खासनविशी व पोतनविशी.
नरसो बल्लाळ - फौजेचे सबनीस.
पांढरे - शरफन मुलुख.
संकराजी नारायण कुलकर्णी - मदारुलमहाम .
बाळोजी पवार - विश्वासराव
काकडे - दिनकरराव
वागमोडे - सेनाबारासहस्त्री.
बंडगर - अमिरूल उमराव
चांदजीराव , हणमंतराव , पदाजीराव साळुंखे पाटणकर - समशेरबहाद्दर
आटोळे - सफेजंगबहादर
थोरात - दिनकरराव
थोरात - रूस्तमराव
पांढरे - शहाजात मुलुख.
महारनवर - फत्तेजंग बहाद्दर.
ठोके - विश्वासराव
संदर्भ--
शिवपुत्र राजाराम
राजारामचरीतम्
मोघल मराठा संघर्ष
ताराबाई कालीन कागदपत्रे
History of Aurangzeb








सिंक्लेअरचा बंगला ...

The Palace of Sinclair...

( भाग - )
मागच्या भागात आपण डॉ. सिंक्लेअर यांच्या त्यांच्या कोल्हापूरबद्दलच्या योगदानाची माहिती घेतली. आता त्यांचा बंगला कसा होता आणि सध्याच्या कोल्हापुरात तो कुठं आहे याबद्दल…
कोल्हापूर ट्रंक रोडवरचा डॉ. सिंक्लेअर यांचा हा बंगला नक्की होता तरी कसा ? तीन बाजूला जितीचा ओढा आणि एका बाजूला कोल्हापूर शहर अशा दोन एकर जमिनीच्या पट्ट्यावर हा डॉ. सिंक्लेअर यांचा अगदी typical ब्रिटिश पद्धतीचा बंगला होता. पूर्वेकडे तोंड करून असलेला हा बंगला, ( म्हणून नावही Sunnyside.) रेसिडेन्सीपेक्षा कोल्हापूर शहरालाच जास्त जवळचा होता. पूर्वेकडे बंगल्यासमोर काही अंतरावरचा जितीचा ओढ्याच्या पलीकडची चढण असलेली शेतवड पार केली की लगेच कोल्हापूचं स्टेशन ! याच शेतवडीत आणि आजूबाजूला नंतर शाहूपुरी विस्तारली. तर मावळतीला कोल्हापूर ट्रंक रोड. त्याच्याही पलीकडून जितीचा ओढा वळणं वळणं घेत थेट पंचगंगेत सामावलेला. नीट लक्ष दिलं तर ब्रह्मपुरीच्या टेकाडाबाजूचा आईसाहेबांचा घाटही बंगल्याच्या मागच्या पोर्चमधून दिसायचा. उत्तरेकडे पुन्हा जितीचा ओढा ओलांडून नागाळ्याच्या माळाची मागची हद्द पार केली की थेट रेसिडेन्सी. दक्षिणेला हाताच्या अंतरावरच बसलेलं कोल्हापूर शहर ! एखाद्या ब्रिटिश काउंटीमधल्या विस्तीर्ण जमिनीवर एकाकीपणे वसलेला दिसायचा हा बंगला. बंगल्याच्या हद्दीला घडीव उंच दगडी खांबांचं कंपाऊंड. (असे खांब अजूनही टाऊन हॉल, ऑल सेंटस चर्च आणि मुंबई फोर्ट मधील सेंट थॉमस कॅथेड्रल इथे बघायला मिळतात.) बंगल्याभोवती डॉ. सिंक्लेअरनी मन लावून जोपासलेली फुलबाग आणि निरनिराळी झाडं. एकप्रकारचं जंगलच ते ! अगदी टाऊन हॉल समोरच्या बागेची स्पर्धा करणारं. २४ तास वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजाने गजबजलेलं ! बंगल्याला चारही बाजूने व्हरांडा. वरती जुन्या पद्धतीची कौलं ! पुढे मागे विस्तीर्ण पोर्च. पोर्चच्या दोन्ही बाजूला टिपिकल ख्रिश्चन पद्धतीची लाकडाच्या पट्टीच्या जाळ्यांच्या भिंती. पोर्च मधून आत गेलं की ऐसपैस पसरलेला हॉल. हॉलमध्ये ब्रिटिश पद्धतीच्या कमानी. दोन्ही बाजूला मोठाल्या बेडरूम. कळंबा पाणी पुरवठा योजनेचा एक नळ एक मुद्दामच या बंगल्याजवळ आणलेला. आधीच शहरापेक्षा खड्ड्यात बसलेला हा परिसर. त्यामुळे पाण्याचा तसा सुकाळच होता. पुढच्या काळात कोल्हापूरात वीज पुरवठा सुरू झाला तेव्हा याही बंगल्याला वीज पुरवठा केला गेला. एकंदरीत रेसिडेन्सीतलं ब्रिटिश राहणीमान कसे असते याची झलक याच बंगल्यामुळे समस्त कोल्हापूरकरांना मिळत होती. नाही म्हणायला असाच एक बंगला खाराळा बागेतही होता, पण तो तसा गावापासून लांबचा. पुढे काळ बदलला. खुद्द डॉ. सिंक्लेअर काळाच्या उदरात गेले. इकडे गाव टप्प्याटप्प्याने बदललं, वाढलं. तटाच्या आतलं कोल्हापूर तटाची भिंत फोडून खंदकापलीकडच्या पेठांमध्ये, दुधात साखर मिसळावी तसे एकरूप होऊन गेलं. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नव्या वसाहती उभ्या राहिल्या. एकेकाळची गावाबाहेरच्या पडजमीनी, शेतवडी, आडव्या तिडव्या इमारतीनी भरून गेल्या. मुद्दाम कोल्हापूरपासून फटकून राहण्यासाठी लांब उभारलेल्या रेसिडेन्सीचा तोरा सुद्धा कधीच उतरून गेला आणि रेसिडेन्सी नाव तर फक्त आता क्लबवर लावण्यासाठीच राहिलंय. याला सिंक्लेअरचा बंगला तरी कसा अपवाद राहील ? बघता बघता तोही शहराच्या मुख्य वस्तीत आला. नुसताच आला नाही तर शहरात गुडूप होऊन गेला. टाऊन हॉलची बाग अजूनही आहे पण सिंक्लेअरनी उभा केलेली दोन एकर बाग कुठल्या कुठे माणसांच्या आणि सिमेंटच्या जंगलात नाहीशी झाली. पण सिंक्लेअरचा बंगला मात्र अजून टिकून राहिलाय. त्याचा एकही चिरा अजून ढळला नाही. आजही त्यामुळे मूळ रूपात बघता येतो.
आता प्रश्न असा आहे की कोल्हापूर ट्रंक रोड आजच्या कोल्हापुरात शोधून त्यावरचा सिंक्लेअरचा बंगला बघायचा कसा ? उत्तर साधंच आहे. ट्रंक रोड म्हणजे दोन महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणारा रास्ता. ब्रिटिशांसाठी कोल्हापुरात महत्त्वाची ठिकाणं दोनच… एक त्यांची रेसिडेन्सी आणि दुसरं, कोल्हापूर शहर ! आणि त्यांना जोडणारा रस्ता म्हणजे ब्रिटिशांचा कोल्हापूर ट्रंक रोड आणि आपल्यासाठी आजच्या काळातला भावसिंगजी रोड ! आणि सिंक्लेअरचा बंगला म्हणजे शाहू स्मारक भावना मागे असणारा बंगला. सीपीआरच्या सिव्हिल सर्जनचं एकेकाळचं अधिकृत निवास स्थान. उंच कंपाऊंड, बाजूलाच असलेल्या सीपीआरच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलच्या इमारती आणि सिंक्लेरच्या काळातली काही प्रमाणात उरलेली उंच झाडे, यामुळे तो रस्त्यावरून पटकन नजरेला पडत नाही. मंगलोरी कौले असलेल्या या बंगल्याची ओळख पटते ती भावसिंगजी रोडवर असणाऱ्या या बंगल्याच्या बंद गेटच्या दोन दगडी खांबांमुळे. हे या बंगल्याचे मूळचं गेट. पश्चिमेकडचं. जरी बंगल्याचा दरवाजा पूर्वेकडे होता तरी प्रवेश मात्र पश्चिमेकडूनच होता. कोल्हापूर शहराच्या जुन्या नकाशात ही हे गेट दिसते.(या नकाशात शिवाजी पूल नाही, पण हा बंगला मात्र आहे. म्हणजे विचार करा हा बंगला किती जुना असेल.) सध्या मात्र आपल्याला शेजारच्या जैन बोर्डिंगजवळच्या नव्या गेटमधून आत जावं लागतं. आत जाऊन उजवीकडील अजून एक बंद गेट पार केलं की आपण पोहोचतो या बंगल्याच्या विस्तीर्ण अशा मागच्या बाजूच्या पोर्चमध्ये. समोरच्या बाजूचं पोर्च आता पक्क्या बांधकामाने बंदिस्त करण्यात आलेले दिसतंय. एकेकाळच्या उघड्या व्हरांडाच्या खुणा लाकडी खांबाच्या आणि दगडी जोत्यांच्या रूपात स्पष्ट दिसतात. आवारात जुन्या काळातल्या विजेच्या दिव्याचे कोरीव लोखंडी खांब जुना काळ आठवत एकाकी उभे आहेत. या खांबांबद्दलचा माझा अंदाज Richardson and Crudass या मुंबईतल्या कंपनीचा होता. तो खरा निघाला. मुख्य दरवाजा उघडून आत गेल्यावर भव्य उंच असा हॉल आणि दोन्ही बाजूला बेडरूम्स असा सगळा टिपिकल ब्रिटिश जामानिमा आहे. डॉ.सिंक्लेअर सुरुवातीपासूनच अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलशी संबंधित असल्याने हा बंगला सुरुवातीपासूनच सीपीआरच्या अखत्यारीतला. त्यामुळे नंतरच्या काळात सीपीआरच्या सिव्हिल सर्जनचं अधिकृत निवासस्थान म्हणून हा बंगला ओळखला जातोय. गेले काही वर्ष इथे कोणीही राहत नाही पण माणसांचा राबता मात्र आहे. बंगला आतून बघायची इच्छा, आमचे मित्र रवीकिशोर माने आणि डॉ. शीतल पाटील यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाली. कित्येक दशकांनंतर डॉ. सिंक्लेअर यांना ओळखणारं, आमच्यासारखं कोणीतरी आल्यामुळे, जणू बंगल्याला आमच्याशी संवाद साधायचा होता. त्यातल्या प्रत्येक खोल्यांमधून फिरताना जुन्या काळात जात असल्याचा भास होत होता. प्रत्येक खोलीला आपली एक वेगळी गोष्ट आम्हाला सांगायची होती. डॉ. सिंक्लेअर यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना पुन्हा आमच्या समोर त्याच ठिकाणी साकारत होत्या. हॉलच्या पंचकोनी आकारातल्या भिंती बघताना मला जाणवलं याच खोलीत पत्नीच्या शवपेटी शेजारी बसून सिंक्लेअरनी शोक केला असेल. माझं शरीर वर्तमानकाळात आणि मन कधीच सिंक्लेअरच्या काळात गेलेलं होतं. मी कसाबसा या अवस्थेतून बाहेर आलो. एक जाणवलं, ही वास्तू फक्त आकारामुळे मुळे महान नाही, तर तिच्यात वास्तव्य केलेल्या डॉ. सिंक्लेअर यांच्या सारख्या महान व्यक्तिमत्वामुळेही ती महान झाली आहे.
संपूर्ण बंगला मनसोक्त बघून झाल्यावर बाहेर निघताना, पोर्चमध्ये आराम खुर्चीवर बसलेल्या डॉ.सिंक्लेअर यांचा भास माझ्या डोळ्यांना झाला. कदाचित डोक्यात हाच विषय भिनल्यामुळे असं झालं असावं. एकेकाळी चौफाळ्याच्या माळा शेजारी असणाऱ्या या दोन एकर जमिनीवरच्या या बंगल्याचं आवार आता काळाच्या ओघात आकसून गेलंय. शहर असं आडवं उभं वाढतानाही ही वास्तु मात्र जुन्या काळाचा एक मुक साक्षीदार बनून शांत आणि निश्चलपणे उभी आहे. पण आता मात्र अनोळखीपणाचं मळभ तिच्यावरही दाटलयं. कधी जर या कोल्हापूर ट्रंक रोडवर जाणं झालं तर मुद्दाम कंपाऊंड पलीकडे बघाच. कदाचित पोर्चमध्ये बसलेले डॉ. सिंक्लेअर तुम्हालाही दिसतील आणि शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीचं ब्रिटिश कोल्हापूर तुमच्यासमोर खुलं करतील.
©️ भारत महारुगडे
९८२२४४९८५६
#आठवणीतलं_कोल्हापूर
चित्र १ : टाऊन हॉल आणि सिंक्लेअर बंगला , १८७८ पूर्वीच्या नकाशात
चित्र २ : टाऊन हॉल आणि सिंक्लेअर बंगला, २०२४ ची स्थिती
चित्र ३ : भावसिंगजी रस्त्यावरून CPR चौकाच्या आधी डाव्या हाताला सिंक्लेअर बंगला
चित्र ४ : सिंक्लेअर बंगला , समोरून
चित्र ५ : बंगल्याचे दगडी जोते, खांब
चित्र ६ : मुख्य गेट आणि घडीव दगडी खांब
चित्र ६ : विस्तीर्ण पोर्च
टीप: कॉमेंट मध्ये पहिल्या भागाची लिंक दिली आहे









गाव दहिगाव , तालुका सुधागड जिल्हा रायगड. या गावाशेजारी हे काही जुने कोरलेले दगड आढळले , काही घराच्या जोते सारखे दिसत आहेत . जवळच जुने मंदिर आहे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा हे नक्की काय असावे.
जोतिबा डोंगर,येथे असलेल्या या वीरगळीबद्दल काही माहिती आहे का ?




१५ मे १७१८ - लंडनमधल्या जेम्स पकल नावाच्या संशोधकाने आजच्या दिवशी जगातल्या पहिल्या मशीनगनसारख्या दिसणाऱ्या एका बंदुकीसाठी पेटंटचा अर्ज भरला. २५ जुलै १७१८ रोजी त्याला हे पेटंट मिळालं.
ही बंदूक नक्की काय आणि कशी होती हे पाहण्याआधी आपण त्या वेळचा थोडा इतिहास बघूयात. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडचा व्यापार (आणि साम्राज्य!) जगभरात पसरायला सुरुवात झाली होती. हा सगळा व्यापार बहुतांशी समुद्रमार्गे चाले. पण ह्यात त्यांना बरेचदा सागरी चाच्यांचा त्रास होत असे. मुख्यत्वेकरून ऑटोमन साम्राज्यातल्या तुर्कांचा. मोठ्या व्यापारी जहाजांवर तोफा वगैरे असत पण हे तुर्की चाचे बरेचदा छोट्या पण वेगवान बोटी घेऊन छापे घालत असत. हे हल्ले परतून लावण्यासाठी मोठी जहाजं आणि त्यावरील तोफा पटकन वळवणं शक्य नसे आणि ह्या गोष्टीचा फायदा घेत हे चाचे जहाजांवर छापे घालत बराच माल लुटून नेत असत. बोटीवर लुटीसाठी आलेल्या चाच्यांशीही बरेचदा लढाया होत असत. पण ते ज्या वेगाने येत त्याच वेगाने निघून जात. ह्यावर काहीतरी उपाय करायची गरज होती आणि त्यावर काम सुरु केलं लंडनमधे तेव्हा वास्तव्यास असणाऱ्या जेम्स पकलने.
जेम्सचा जन्म साधारणपणे १६६७ मधला. नॉर्फोकचा. नशीब काढायला हा माणूस लंडनला आला. हा पेशाने वकील होता पण लेखनही करत असे. त्यासोबतच तो संशोधकही होता. व्यापारी जहाजं आणि रॉयल नेव्हीलाही उपयोगी ठरू शकेल अश्या छोट्या पण परिणामकारक बंदूकीच्या डिझाईनवर त्याने काम करणं सुरु केलं. त्यावेळी वापरल्या जाणाऱ्या बंदुका तोड्याच्या (Flintlock) होत्या. ह्या वापरायला बऱ्यापैकी त्रासदायक होत्या. बंदुकीत पुढून दारू आणि मग गोळी वगैरे भरून बार काढावा लागत असे. मग बार पुन्हा भारावा लागत असे. एका मिनीटांत एक गोळी कशीबशी मारता येत असे. हलत्या जहाजांवरून बंदूक चालवणे अजूनच कठीण काम असे. आणि नेमही लागायची शक्यता कमीच असे. हे सगळे प्रश्न सोडवायचं जेम्सने ठरवलं.
त्यानुसार त्याने बंदुकीची रचना सुरु केली. सर्वप्रथम त्याने एका ट्रायपॉडची निर्मिती केली जो रोवून त्यावर बंदूक ठेवता येईल. ही बंदूक जलदगतीने गोळ्या चालवेल आणि ती बंदूक ३६० अंशात कुठेही हलवता येईल. ह्यामागचा विचार असा होता की जहाजाच्या डेकवरून पाण्यात छोट्या बोटींवर गोळ्या मारता येतीलच पण जर चाचे जहाजांवर चढून आले तर डेकवरून ती उलटी वळवून त्यांच्यावरही गोळीबार करता येईल. आणि हे सगळं करताना बंदूकीचा वापर करण्यासाठीचे पुढचे बार आधीच भरता यायचीही सोय हवी कारण नाहीतर ही महागडी पितळी बंदूक गोळ्या संपल्या म्हणून शत्रूच्या हाती पडायला नको. काळाच्या किती पुढचे विचार होते जेम्सचे पहा!
ह्याप्रमाणे त्याने आराखडे तयार केले आणि बंदूक बनवून ती रॉयल नेव्हीला दाखवली. ते साल होतं १७१७. ही बंदूक त्याला लावलेल्या एका सिलेंडरमधून एका मिनीटांत नऊ गोळ्या चालवू शके. बंदूकीला नऊ सिलेंडर्स होतो. ते वापरून जेम्सने सात मिनीटांत त्रेसष्ठ गोळ्या चालवून दाखवल्या. ऐनवेळेस वापरण्यासाठी ज्यादाच्या सिलेंडर्समधे दारू व गोळ्या भरून ती बाजूला ठेवायची सोयही ह्यात होती. पण रॉयल नेव्हीच्या पसंतीला ही बंदूक काही आली नाही. कारण ह्या बंदुकीत इतके हलणारे आणि गुंतागुंतीचे भाग (त्या काळच्या तंत्रज्ञानाच्या मानानेही बरेच पुढचे!) होते की त्यांची निर्मिती आणि सांभाळ करणं त्यांना कठीण वाटलं. सबब त्यांनी ती बंदूक सपशेल नाकारली.
पण जेम्स खचला नाही. त्याने १५ मे १७१८ रोजी ह्या बंदूकीचे पेटंट घेतले. (त्याचे फोटो सोबत पहाता येतील.) आणि त्याद्वारे निधी गोळा करून एक कंपनी बनवली. त्याची कल्पना अशी होती की रॉयल नेव्ही जाऊदे पण आपण ही बंदूक बाकी लोकांना विकूया. १७२१ मधे त्याने ह्या बंदुकांची निर्मिती सुरु केली. १७२२ मधे वूलीच गार्डन्समधे त्याने ह्या बंदुकींचं एक प्रदर्शन आयोजित केलं होतं. तिथेही त्याने सात मिनीटांत त्रेसष्ठ गोळ्या मारून दाखवल्या. लोकं हे पाहून अगदी आश्चर्यचकित झाले पण त्याला व्यावसायिक यश काही मिळालं नाही. फक्त एका ब्रिटीश ड्यूकने वेस्ट इंडीजच्या मोहीमेसाठी जेम्सकडून दोन बंदुका विकत घेतल्या इतकंच काय ते. आजही त्या दोन बंदुका इंग्लंडमधे ठेवलेल्या आहेत. जेम्सची कंपनी पुढे बंद झाली आणि १७२४ मधे जेम्सही वारला.
ह्या बंदुकीचं नाव त्याने ठेवलं होतं “डिफेन्स गन” पण ती त्याच्या आडनावावरून “पकल गन” म्हणूनच ओळखली आणि हेटाळली गेली. पेटंट कागदांवरही जेम्सची काव्यात्म शैली दिसते. त्याने त्यातही यमक लिहीलंय:
“Defending KING GEORGE, your COUNTRY, and LAWES
Is defending YOUR SELVES and PROTESTANT CAUSE”
(आणि हे त्याने बंदुकीवर कोरुनही घेतलं होतं. फोटोत पहाता येईल.)
तसं पहाता व्यावसायिकदृष्ट्या अगदीच अपयशी ठरलेली ही बंदूक. मशिनगनपेक्षा एका भल्यामोठ्या रिव्हॉव्लरसारखी. पण जेम्सच्या संशोधक वृत्तीची ती साक्ष देते. आजच्या भाषेत बोलायचं तर बंदुकांच्या जगातली “मार्केट गॅप” त्याने व्यवस्थित ओळखली होती आणि त्यावर विचार करून आणि खपून त्याने त्याचं डिझाईन बनवलं. त्यावरून बंदूकही बनवली. आणि विचार करा - हे सगळं १७१७-१७१८ मधे - ३०६ वर्षांपूर्वी - म्हणजे आपल्याकडे पहिले बाजीराव पेशवे गादीवर यायच्या आधी!
आपण ह्या सगळ्या वैज्ञानिक दृष्टीकोनांच्या बाबतीत खूप मागे पडलो असं वाटत नाही का? जरा ह्याबद्दल आपण विचार करूयात का?
- संकेत कुलकर्णी (लंडन)
फोटोजः जेम्स पकल. त्याचं पेटंट. “पकल गन” चे काही फोटो.
तळटीपः इथपर्यंत वाचत आलांत तर त्या पेटंटचा फोटोही पुन्हा एकदा पहा. त्यात उजवीकडे दोन सिलेंडर चेंबर्सचे डिझाईन आहेत. जेम्सच्या भाषेत भावार्थ सांगायचा झाला तर (१७) गोल गोळ्या - ख्रिश्चनांवर चालवण्यासाठी. (जरा माणुसकीच्या मार्गाने!) आणि (१६) चौकौनी गोळ्या - तुर्की मुसलमानांवर चालवण्यासाठी (कारण त्या वेड्यावाकड्या जात जास्त नुकसान करतील!)



                       श्री मार्तंड चरणी
दृढभाव खंडोजी
सुत रायाजी जाध
व राव
श्रीरामभक्त भुईंजकर जाधवराव घराणें आणि रामदासी संप्रदाय.
भुईंजच्या जाधवराव घराण्याच्या मस्तकीचा मुकुटमणी म्हणजे श्रीमंत रायाजीराजे जाधवराव. शिवछत्रपतींचे मातुल आजोबा श्रीमंत लखुजीराजे यांचे खापर पणतू खंडोजीराजे यांचे रायाजीराजे हे सर्वात थोरले नातू होय. रायाजीराजे छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) यांचे अत्यंत विश्वासू व सातारा दरबारातील मान्यवर सरदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना एकूण १५ लाख रुपये उत्पन्नाचा सरंजाम शाहू महाराजांनी दिलेला होता. (भुईंजमध्ये असलेला प्रसिद्ध घुमट हा याच रायाजीराजेंची समाधी छत्री आहे.)
श्री शाहू छत्रपतींच्या काळात मराठेशाहीस स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर रामदासी संप्रदायाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. समर्थ रामदासांच्या पश्चात त्यांचे पट्टशिष्य कल्याणस्वामी यांनी मौजे मर्ढे या गावी कृष्णाकाठी रामदासी मठाची स्थापना केली. इथेच त्यांनी दासबोध ग्रंथ लिहून पूर्ण केल्याची माहिती मिळते. त्यांच्यापुढे हा मठ अनेक पिढ्या कार्यरत होता. सद्यस्थितीत हा मठ कार्यरत नसला तरी मर्ढे येथे पाहता येतो.
श्रीशके १७२१ चैत्र वद्य एकादशीचे (१६ एप्रिल १७९९) श्रीमंत रायाजीरावांचे पावनबाबा रामदासी यांना दिलेले वतनपत्र उपलब्ध झाले त्यानुसार,
मौजे मर्ढे, संमत लिंब, प्रांत वाई येथे पुर्वी श्री अमृतस्वामी यांनी श्रीरामचंद्राच्या मुर्तीची स्थापना करुन प्रतिवर्षी रामनवमीचा उत्सव, पुजा, नैवेद्य व संस्थानचा खर्च करत आले. त्याप्रमाणे आपणही (पावनबाबा) करत आहात. तेव्हा तुमचे चालवणे आम्हांस श्रेयस्कर हे जाणून, आमच्याकडे पुर्वपार सरकारातून जो भुईंज गाव इनाम आहे, त्या गावाजवळ मालदेवाची वाडी (मालदेववाडी) येथे १० बिघे जमीन नुतन इनाम करुन हे इनामपत्र आपणांस दिले आहे. तरी सदरहु जमीन तुम्ही व तुमचे पुत्र पौत्रादी वंशपरंपरेने अनुभवून पुर्ववत श्रींचा उत्सव करत जाणे.
या पत्रावरुन श्रीमंत जाधवराव सरकारने मर्ढे येथील रामदासी मठास रामनवमी उत्सवाकरीता मालदेववाडी (भुईंज) येथील १० बिघे जमीन वतन दिल्याची माहिती मिळते.
तसेच यातून रायाजीराजेंचा अष्टकोनी शिक्का व मोर्तब सूद सुद्धा पहिल्यांदाच प्रकाशात आली. सदर शिक्क्यात "मार्तंड चरणी दृढभाव" अशी उक्ती आहे. मार्तंड अर्थात श्री म्हाळसाकांत मल्हारी मार्तंड (श्रीक्षेत्र मुळठाण पाल-पेंबर) हे जाधवरावांचे कुळदैवत आहे. रायाजींच्या वडीलांचे नाव (खंडोजी) व शिक्क्यातील 'मार्तंड चरणी दृढभाव' या गोष्टींमुळे जाधवरावांची आपल्या कुळस्वामीवर असलेली श्रद्धा उद्धृत होते.
संदर्भ: श्रीसमर्थ संप्रदायाची कागदपत्रे खंड २
{सदर‌ पत्र पाहता, याचा कालखंड इ.स.१७९९ दिसतो. लेखात वरती नमूद केलेल्या श्रीमंत रायाजीराव राजे यांना २५ फेब्रुवारी १७२८ रोजी पालखेडच्या युद्धात वीरगती प्राप्त झाल्याची माहिती मिळते. तसेच रायाजीराजेंच्या वडीलांचे नाव लखुजी/लखमोजी (तिसरे) आहे. त्यामुळे सदर पत्रात नमूद रायाजीराजे हे रायाजीराजे द्वितीय असावेत असा अंदाज बांधता येतो. पराक्रमी पुरुषांची नावे पुढील पिढ्यांसही देण्याची पद्धत मराठा घराण्यांत पुर्वपार प्रचलीत आहे.}
भुईंज मधील जाधवराव इनामदार वाड्यात कल्याणस्वामींनी स्थापन केलेले श्रीराम पंचायतन आहे. आजही इनामदार वाड्यात मोठ्या प्रमाणावर अगदी पारंपरिक पद्धतीने न‌ऊ दिवसांचा रामनवमी उत्सव व रामजन्म सोहळा साजरा केला जातो.
(योगायोगाने याचवर्षी रामनवमी दिवशीच लहानपणीच्या रामनवमीच्या आठवणी, रोज रात्रीच्या नारदीय किर्तनाच्या आठवणी आणि उत्साही रामजन्म सोहळ्यावर लिहिणार होतो, दुर्दैवाने ते शक्य झाले नाही पण परवा 'सीतानवमी'ला आमचे सन्मित्र, इतिहास अभ्यासक Rohit Pawar यांनी सदर पत्र उपलब्ध करुन दिले आणि जाधवरावांच्या श्रीराम भक्तीवर लिहिण्याचा योग शेवटी आलाच..)
✍🏻 स्वप्नील महेंद्र जाधवराव.

शिवकाळातील व्यापार-धोरण व बाजारपेठ व्यवस्था
शिवकालात खेडे हा आर्थिक जीवनाचा पाया होता आणि शेतीव्यवसाय हा या जीवनाचा मानबिंदू होता. शेती हा प्रमुख व्यावसाय असल्याने त्याच्या विकासासाठी लागणारे बरेचसे उपव्यवसाय या खेड्यातून सुरु झालेले दिसून येतात. परमानंद लिखित ‘शिवभारत’ ग्रंथात सतराव्या शतकातील काही व्यवसायांचे नामोल्लेख आलेले आहेत. सोनार, लोहार, तांबट, सुतार, चांभार, कुंभार, कोष्टी, बाणकरी, मांग, तेली, धनगर, कोमटी(बांबू व्यवसाय करणारे) इत्यादी व्यवसायांचे उल्लेख आढळतात. याखेरीज शिंपी, न्हावी, परीठ, गवंडी, माळी, रंगारी हे देखील ग्रामीण कारागीर होते. पखवाजी, पावेकरी, टाळकरी, वीणेकरी ही वाद्ये वाजविण्याचा धंदा करणारी मंडळी देखील खेडेगावात विखुरलेली होती. तांबोळी, कलाल(दारूविक्रेते), कासार, बुतफरोशी(मूर्तिविके) इत्यादी व्यावसायिक मंडळी देखील आढळतात.
कसबी कारागीर आपल्या उत्तम वस्तू नजीकच्या कसब्याच्या बाजारात नेऊन विकत असत. बाजार भरण्याचे दिवस निरनिराळे असल्याने कारागिराला आपल्या वस्तू निरनिराळ्या बाजारात विकण्याची संधी मिळत असे. आजही आपल्याकडे अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरण्याची प्रथा टिकून आहे.
एखाद्या राष्ट्राचे सार्वभौमत्व टिकवायचे असेल तर त्या राष्ट्राची अर्थव्यवस्था ही भक्कम असायला हवी. अर्थव्यवस्था भक्कम करण्याची प्राथमिक जबाबदरी त्या राष्ट्रातील राज्यकर्त्यांची आणि पर्यायाने व्यापाऱ्यांची असते. हाच धागा पकडत आज्ञापत्रात रामचंद्रपंतानी साहुकार हे प्रकरण अगदी समर्पकरित्या शब्दबद्ध केले आहे. साहुकार हा व्यापारासाठी आलेला समानार्थी शब्द आहे. स्वराज्याच्या सर्वांगीण विकासाकडे शिवाजी महाराजांचे लक्ष होते.
व्यापारवृद्धीशिवाय राज्य भरभराटीला येणार नाही याची त्यांना खात्री होती.
आज्ञापत्रात शिवाजी महाराजांचे व्यापारविषयक धोरण सूत्ररूपाने आले आहे. हे धोरण आपल्याला बरेच काही सांगून जाते. “साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकाराकरिता राज्य अबादान होते न मिळे ते वस्तूजात राज्यात येते राज्य श्रीमंत होते पडिले संकट प्रसंगी पाहिजे ते कर्जवाम मिळते तेणेकरून आले ते संकट परिहार होते साहुकाराचे संरक्षणामध्ये बहुत फाईदा आहे. याकरिता साहुकारांचा बहुमान चालवावा कोण्हे विषई त्यावरी जलल अथवा त्याचा अपमान होऊ न द्यावा. पेठा पेठात दुकाने वखारा घालोन हत्ती घोडे नरमिना(उंची कपडे) जरबाब(जरतारी वस्त्रे) पशमी(लोकरी वस्त्रे) आदिकरून वस्त्रजात व रत्ने आदि करून विशेष वस्तुजात यांचा उदीम चालवावा. हुजूर बाजारामध्येही थोर थोर सावकार आणून ठेवावे. वर्ष संमंधे तैसेच लग्नादी महोत्सवी त्यांचे योग्यातेनुरूप प्रातष्ठेने बोलावून आणून वस्त्रे पागे देऊन समाधान करीत जावे.”
शिवाजी महाराजांची नीती सांगताना रामचंद्रपंत पुढे लिहितात, “परमुलकी जे जे सावकार असतील त्यांची समाधाने करून ते आणावे. त्यासी अनुकूल पडे तरी असील तेथेच त्यांचे समाधान रक्षून आपली माया त्यास लाऊन त्याचे मुतालिक आणून त्यास अनुकूल ते जागा दुकाने देऊन ठेवावे तैसेच दर्यावर्दी सावकार त्यांसहि बंदरोबंदरी कौल पाठऊन आमदरप्ती करवावी. सावकारांमध्ये फिरंगी इंगरेज वलडेज फरासीस डिंगमारादि टोपीकर हेहि लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खवंद प्रत्यक प्रत्यक राज्यच करितात.”
परमुलकी सावकार असतील तर ते आणावेत. ते नाही आले तर त्यांचे मुतालिक आणावेत व व्यापारवृद्धी करावी. युरोपमधील साहुकारांचा धोका व्यक्त करताना त्यांच्या महत्वाकांक्षी स्वभावाची ओळख आपल्या लोकांना होती हे दिसून येते. परमुलकी साहुकार मंडळी ही साहुकार नसून त्यांना एखादे स्थळ मिळते तर ते त्यावरील आपला ताबा अजिबात सोडत नाही. ते तुमची आज्ञा पाळत नाहीत. इंग्रजांची साम्राज्यवादी संकल्पना शिवप्रभूंनी ओळखलेली होती. म्हणूनच परकीय व्यापाऱ्यांबद्दल त्यांचे धोरण अखंड सावधानतेचे होते.
कसब्याच्या अथवा पेठेच्या गावात आठवड्यास बाजार भरत असे. दैनंदिन लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी आजूबाजूच्या गावातून लोक ह्या बाजारांमध्ये जमत असत. कसब्याच्या बाजारासाठी बाहेरूनही काही व्यापारी आपल्या खास वस्तू विकण्यासाठी येत. धान्य, कापड, लोणी, पण, सुपारी, फळे, भाज्या, नारळ, मांस इत्यादी विविध वस्तू या बाजारात येत. कसब्याचा बाजार मोठा असे. तेली, भाजीविके, चांभार, कोष्टी, विणकर, शिंपी, कलाल इत्यादी व्यापाऱ्यांची दुकाने कायम स्वरुपाची असत.
पेठेच्या वसाहतीची आणि विकासाची जबाबदारी शेटे या वतनदाराकडे असे आणि य पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजनाकडे असे. पेठेच्या वसाहतीच्या कामासाठी शेट्याला सारामाफ जमीन मिळत असे. पेठेच्या वसाहतीसाठी शेटे या अधिकाऱ्याची आवश्यकता असली तरी ती संपन्न करण्यासठी आणखी एका अधिकाऱ्याची गरज भासत असे. त्याला बिडवई म्हणत असे. या बिडवईला काही वर्षांच्या करारावर नेमले जात असे.
जिजाबाई साहेबांचे २ जानेवारी १६५७ रोजीचे पाषाण येथील जिजापूर पेठेचे सर्व अधिकार पुण्याच्या वेदमूर्ती विनायकभट ठकार यांस देण्यासंबंधीचे पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रात पेठेच्या अधिकाऱ्यांची नोंद आलेली आहे ती पुढीलप्रमाणे-
शेटेपण
महाजनपण
बिडवईपण
कोतवालकी
मेहतरकी
डबहलकी(मसुदा तयार करणे)
खुम
पानसरकी(वजनमापांचा अधिकारी)
बिडवईने पेठेची मामुरी करणे असे मोघमपणे एका पत्रात म्हटले आहे. त्यासाठी त्याला हे अधिकार मिरासी करून दिले आहेत. प्रस्तुत पत्रात महाजन व बिडवईपण एकाच व्यक्तीस दिले आहे. बिडवई हा पेठेचा पुढारी असल्याने त्याचे मुख्य काम व्यापाऱ्यांना आपल्या पेठेकडे आकर्षित करून घेणे हे होते. पेठेत येणाऱ्या व्यापाऱ्यांवर जकात आकारली जात असे आणि याचा काही हिस्सा बिडवईला मिळत असावा. कारण एका पत्रात एका अर्जदाराने बिडवईपण आपणास मिरास औलादअफलाद करून दिल्यास आपण जकातीची वसूल नेटाने करू असे म्हटले आहे.
शेटे हा गावच्या गोतसभेचा एक सभासद असे. गावच्या महजरावर त्याची नावनिशाणी असे. तो मिरासदार असल्याने त्याला राहण्यास पेठेत जागा मिळत असे. पेठेची उत्तम व्यवस्था राखता यावी म्हणून तो सर्व व्यापाऱ्यांची नोंद करून ठेवीत असे. पेठांमध्ये जुन्या नव्या सभासदांची नोंद स्वतंत्रपणे केली जात असे. इंदापूरच्या एका यादीत कदीम(जुने) या कलमाखाली ३ सराफ, १ सोनार, ५ तेली, २ शिंपी आणि जदीद(नवे) या कलमाखाली ५ सराफ, २ सोनार, आणि ९ तेली दाखविले आहेत. यावरून बाजारपेठेची वाढ व त्यातील व्यावसायिकांची माहिती समजून घेता येते.
पेठेची भरभराट करण्यासाठी काही सवलती द्याव्या लागत असे. चेऊल परगण्यातील रुस्तुमाबाद या पेठेची भरभराट व्हावी अशी अधिकाऱ्यांची इच्छा होती. रामनगर येथील पेठ वसविल्यानंतर त्या पेठेला काही सवलती व १२ वर्षांची करमाफी दिल्याचे शिवाजी महाराजांचे २ सप्टेंबर १६७५ सालचे पत्र उपलब्ध आहे.
पेठांच्या निर्मितीसाठी सरकारांतून आज्ञा येत असे. शासकाच्या किंवा राजाच्या नावांवरून पेठांना नावे दिल्याची उदाहरणे दिसून येतात. पुण्याजवळील पाषाण येथे ‘जिजापूर’ नावाची पेठ जिजाबाई साहेबांच्या नावे वसविण्यात आली. खेड गावाला जोडून असलेली ‘शिवापूर’ नावाची पेठ शिवाजी राजांच्या नावे वसविलेली होती. शिवाजी राजांच्या पूर्वजांच्या नावे देखील पेठा वसविलेल्या दिसतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या मालोजी, खेलोजी, परसोजी, विठोजी यांच्या नावाने औरंगाबाद येथे वसविलेल्या पेठा होत.
पेठांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असे. शत्रू हल्ल्यात पेठेचे नुकसान झाले तर ती पुन्हा वसविली जात. पुन्हा व्यापर करण्यास प्रोत्साहन दिले जात. हल्ल्यात नुकसान झालेले असल्याने करात सुट देण्यात येत असे. नवा कर लगेच लावण्यात येत नसे. व्यापार वाढीस गरजेच्या गोष्टी करण्यात येत. करमाफीची उदाहरणे आपण वर पाहिली आहेत.
व्यापारवाढ हे किती महत्वाचे अंग आहे हे शिवाजीराजे योग्यप्रकारे जाणून होते. म्हणून त्यांनी याच्या वाढीस योग्य त्या गोष्टी केल्या.
टीप:- सदर चित्र हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे.
संदर्भ:
शिवभारत
आज्ञापत्र
शिवचरित्र साहित्य खंड २, ३, ६, ८, ९, १०
शिवकालीन महाराष्ट्र
- तुषार माने


खाली दोन पुरातन मुर्त्या आहेत. पहिली 450/500 पुरातन कालिका माता आहे, बॉर्डवे ता कणकवली जि सिंधुदुर्ग तर दुसरी कल्लमा, अंकोला कारवार इथली अशीच पुरातन मूर्ती. दोन्ही मूर्तीच्या खाली तीन डोकी आणि उंट कोरलेले आहेत. ह्या दोन्हींचा काय अर्थ आहे. आणि कोकणात उंट कुठून आले. तसेच अशा प्रकारच्या मुर्त्या आणखी कुठे आहेत काय.

राजवंश भारती : पुष्पभूती राजवंश

सकाळ वृत्तसेवा

Hugh N. Tseng's Traditional Oil Painting & Clay 'Seal' of Harsha from Nalanda.esakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

एक प्रजाहितदक्ष राजा, उत्तम प्रशासक, शूर योद्धा, प्रेमळ बंधू, सर्व धर्म, कला व विद्या यांचा आश्रयदाता अशा विविध गुणांनी संपन्न असलेला दिग्विजयी सम्राट, भारताने विक्रमादित्यानंतर हर्षवर्धनाच्या रूपाने पाहिला. इ. स. ६०५ ते ६४७ हा हर्षाचा राज्यकाळ आहे. या काळात तो उत्तर भारतातील एक श्रेष्ठ सम्राट होता. दुर्दैवाने हर्षाला कोणी उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर पुष्पभूती वंशच खुंटला. (saptarang latest article on Pushpabhuti Dynasty)

गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर भारतात ठिकठिकाणी नव्या राजवटी उदयाला आल्या. काळाच्या ओघात त्यातल्या काही अगदी नगण्य ठरल्या; तर काही नावारूपाला आल्या. उत्तर गुप्त, मौखरी हे राजवंश स्थापन झाले, त्याच सुमारास ‘स्थानेश्वर’ या ठिकाणी एक नवा राजवंश रुजला. पुष्पभूती अथवा पुष्यभूती या नावाच्या सामंताने आपली स्थानिक राजवट सुरू केली.

त्याच्या नावावरून या वंशाला पुष्पभूती किंवा पुष्यभूती वंश म्हणतात. स्थानेश्वर म्हणजे आजच्या हरियानामधील ‘ठाणेसर’. या वंशाला कीर्ती मिळवून देणारा सुप्रसिद्ध सम्राट म्हणजे ‘हर्षवर्धन’!पुष्पभूती वंशाची माहिती मिळण्याचे मुख्य स्रोत म्हणजे बाणभट्टाचे ‘हर्षचरित’, चिनी प्रवासी ह्यू एन. त्सेंगचे इतिवृत्त आणि बांसखेरा, सोनपत, मधुबन या ठिकाणी सापडलेले हर्षाचे ताम्रपट आणि नालंदा येथील मातीचे ‘सील’- मुद्रा.

बांसखेराच्या ताम्रपटात संस्थापक पुष्पभूतीचा उल्लेख तर नाही; पण महाराज नरवर्धन, राज्यवर्धन, आदित्यवर्धन आणि हर्षाचा पिता प्रभाकरवर्धन अशी वंशावळ दिलेली आहे. पुष्पभूतीचा उल्लेख बाणाच्या हर्षचरित्रात दंतकथेच्या स्वरूपात आलेला आहे. साधारणत: इ. स. ५०० च्या आसपास ही राजवट स्थापन झाली असावी.

पुष्पभूती वंशाचे पहिले काही राजे फारसे नाव घेण्याजोगे नव्हते. प्रभाकरवर्धन हा मात्र कीर्तिवंत ठरला. त्याच्यामुळे पुष्पभूती वंशाला ‘वर्धन’ वंश असेही नाव मिळाले. राज्यवर्धन, हर्षवर्धन आणि राज्यश्री ही त्याची अपत्ये भारताच्या इतिहासात ठळकपणे नोंदली गेली आहेत. राज्यश्रीचा विवाह मौखरी राजा ग्रहवर्मनाशी झाला. (latest marathi news)

प्रभाकरवर्धन इ. स. ५०५-६ च्या सुमारास खूप आजारी झाला. त्याने मोहिमेवर असलेल्या राज्यवर्धनाला बोलावून घेतले. तो येईपर्यंत प्रभाकरवर्धनचा मृत्यू झाला. राणी यशोमतीने त्याआधीच अहेवमृत्यू पत्करला. आधीच विरक्तीकडे झुकण्याचा स्वभाव असलेला राज्यवर्धन यामुळे अगदीच उदासीन झाला.

त्याने हर्षाकडे राज्य सोपविले आणि संन्यास घेण्याची तयारी केली. हर्षाचीही खरे तर राजा होण्याची इच्छा नव्हती; पण एक अगदी अनपेक्षित घटना तेव्हाच घडली- राज्यश्रीचा पती ग्रहवर्मन याची हत्या देवगुप्ताने केली आणि तिला कैद केले. गौड राजा शशांकाची त्याला साथ होती.

या अन्यायाचा सूड घेण्यासाठी संन्यासाचा विचार बाजूला ठेवून राज्यवर्धन देवगुप्तावर चालून गेला. त्याने देवगुप्ताला मारले, राज्यश्रीची सुटका केली. पण, शशांकाने वरकरणी समेटाची बोलणी करून लबाडीने राज्यवर्धनाला मारले. राज्यश्री अरण्यात परागंदा झाली. या घटनेमुळे हर्षाचे आणि पर्यायाने भारताचेही भवितव्य बदलले!

शोकसंतप्त हर्षाने भावाच्या हत्येचा प्रतिशोध घेण्याची प्रतिज्ञा केली आणि तो शशांकावर चालून गेला. या युद्धात कामरूप नरेश भास्करवर्मन त्याचा सहकारी होता. हर्षाने शशांकाचा पूर्ण पाडाव केला. तो कसाबसा निसटला आणि जिवानिशी वाचला; पण राज्य गेले. त्याच्या सिंहासनावर हर्षाने भास्करवर्मनला बसविले.

इकडे राज्यश्रीचा शोध घेऊन हर्षाने मौखरी राज्य तिला सुपूर्द केले; पण ग्रहवर्मनाचा कोणी वंशज शिल्लक नसल्याने मंत्र्यांच्या विनंतीवरून हर्षाने स्वत: राज्यकारभार हाती घेतला. आधी त्याने राज्यश्रीचा प्रतिपालक म्हणून कारभार केला; पण नंतर मौखरी राज्य आपल्या राज्यात विलीन करून संपूर्ण राज्याची राजधानीच स्थानेश्वरहून कन्नौजला हलवली.

तसे पाहिले तर हर्ष शूर असला, तरी स्वभावाने आक्रमक नव्हता. त्याच्या शशांकावरील स्वारीशिवाय अन्य कोणतीही मोठी स्वारी नोंदलेली आढळत नाही. तसा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी हा हर्षाचा मोठा प्रतिस्पर्धी होता. पण, इतिहास सांगतो, की हर्षाला पुलकेशीने पराजित केले. ती ‘नर्मदेची लढाई’ म्हणून ओळखली जाते.

पुलकेशीने हर्षाचे राज्य ताब्यात घेतले नाही; पण त्याला दक्षिणेपासून कायम दूर ठेवले. त्या काळी भारताचे उत्तरापथ आणि दक्षिणापथ असे दोन भाग समजले जात. त्यापैकी हर्ष हा उत्तरापथाचा अधिपती (‘सकल उत्तरापथेश्वर’), तर पुलकेशी ‘दक्षिणापथाचा स्वामी’ असल्याचे चालुक्य नोंदीच सांगतात.

हर्षाचे स्वामित्व गुजरातच्या ‘वालभी’ राजांनीही मान्य केले होते. सम्राटपदी बसल्यावर कालांतराने हर्षाने ‘शीलादित्य’ ही उपाधी घेतली होती. एक नावीन्यपूर्ण गोष्ट म्हणजे, बांसखेरा ताम्रपटावर हर्षाची चक्क स्वाक्षरी आहे. ‘स्वहस्तो मम महाराजाधिराज श्री हर्षस्य’ अशी ती लांबलचक स्वाक्षरी आहे!

बाणाने हर्षचरितात शशांकावरील स्वारीचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. हर्षाच्या आयुष्यातील काही घटना आपल्याला ह्यू एन. त्सेंग अर्थात् युवान श्वांगच्या ‘सी- यू- की’ या ग्रंथात आढळतात. अर्थात, त्सेंग स्वत: बौद्धमतवादी असल्याने त्याने हर्षाचे चित्रण बौद्ध दृष्टिकोनातून केले आहे.

दुसरीकडे बाण मात्र हर्षाला कट्टर शैवपंथीय म्हणतो. हर्ष विद्या व कलेचा मोठा आश्रयदाता होता. बाणभट्ट त्याच्या पदरी होताच; पण ह्यू एन. त्सेंगची कीर्ती ऐकून हर्षाने त्याला मोठा मान देऊन आपल्या दरबारी बोलावले होते‌. हर्ष आपल्या कारकीर्दीत दर पाच वर्षांनी ‘धर्मपरिषदे’चे आयोजन करीत असे.

त्या वेळी तो आपली सर्व संपत्ती दान करून टाकत असे. अशाच एका धर्मपरिषदेला ह्यू एन. त्सेंगही हजर होता. हर्षाने स्वत: तीन संस्कृत नाटके लिहिली आहेत. त्यातील ‘नागानंद’ हे नाटक व ‘जीमूतवाहन’ हा त्या नाटकाचा नायक प्रसिद्ध आहे. इ. स. ६०५ ते ६४७ हा हर्षाचा राज्यकाळ आहे.

या काळात तो उत्तर भारतातील एक श्रेष्ठ सम्राट होता. दुर्दैवाने हर्षाला कोणी उत्तराधिकारी नव्हता. त्यामुळे त्याच्या निधनानंतर पुष्पभूती वंशच खुंटला. हर्षाचा मंत्री अर्जुन (वा अरुणाश्व‌?) याने कन्नौजचे सिंहासन काबीज केले; पण तो काही दिवसांतच तिबेटी सैन्याच्या आक्रमणात मारला गेला.

पुष्पभूती साम्राज्याची शकले झाली. एक प्रजाहितदक्ष राजा, उत्तम प्रशासक, शूर योद्धा, प्रेमळ बंधू, सर्व धर्म, कला व विद्या यांचा आश्रयदाता अशा विविध गुणांनी संपन्न असलेला दिग्विजयी सम्राट भारताने विक्रमादित्यानंतर हर्षवर्धनाच्या रूपाने पाहिला. 

सर्वात भव्य चैत्यगृह

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी

मुंबई-पुणे महामार्गावरून जाताना एका बाजूला लोहगड-विसापूर किल्ल्यांची जोडी दिसते, तर त्याच्या विरुद्ध बाजूला आई एकवीरा देवीचं मंदिर असलेला पवित्र डोंगर लक्ष वेधून घेतो. लोणावळ्यापासून अगदी जवळ असलेला हा परिसर ट्रेकर, पर्यटक, अभ्यासकांना कायम खुणावत आलेला आहे.

इथं असलेले लोहगड, विसापूर, राजमाचीसारखे बलाढ्य किल्ले आणि भाजे, बेडसे, कोंढाणेसारख्या लेणी कायम त्यांना खुणावत असतात. पावसाळ्यात हा परिसर निसर्गदृष्ट्या कशाच्याही तुलनेत कमी भासत नाही.

याच भागात असणारा एक अतिशय महत्त्वाचा लेणीसमूह म्हणजे ‘कार्ले’. दोन हजार वर्षांचा इतिहास लाभलेल्या या लेणींना आणि आई एकवीरा देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येनं लोक येत असतात. देशातल्या धार्मिक स्थापत्याच्या यादीत कार्ले लेणी स्वतःचं वेगळं महत्त्व टिकवून आहे.

इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सन चौथ्या शतकापर्यंत या ठिकाणी लेणीनिर्मितीची प्रक्रिया सुरू होती. एकूण सोळा लेणींचा समूह आहे. ब्राह्मी लिपीत लिहिलेले ३५ पेक्षा जास्त शिलालेख या लेणींच्या निर्मितीची कहाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. सातवाहन तसेच पश्‍चिमी क्षत्रप या राजघराण्याचे शिलालेख आढळत असले,

तरीसुद्धा लेणी निर्मितीसाठी देणगी प्रामुख्यानं व्यापारी, व्यापारी संघ आणि भिक्खूंनी दिल्याचं वाचावयास मिळतं. त्यातही, ‘धेनूकाकट’ नामक गावातून सर्वांत जास्त प्रमाणात देणगी आल्याचं या शिलालेखांमधून समजतं. ‘धेनूकाकटा यवनस सिहधयान थबो दानं’ म्हणजे, धेनूकाकट येथील सिहध्यान नामक यवन व्यक्तीकडून या स्तंभाचे दान देण्यात आले, अशा स्वरूपाचे उल्लेख या लेखांमधून वाचावयास मिळतात. हे गाव आज नक्की कुठे असावे, याविषयी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.

या लेणीचं पुरातन नाव ‘वलूरक’ असल्याचंही समजतं. प्राचीन कल्याण आणि सोपारा बंदरांना जोडणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यापारी मार्गावर असणारी कार्ले लेणी प्रसिद्ध आहे ती भव्य चैत्यगृहामुळं. असं सांगितलं जातं, की हे देशातलं सर्वांत भव्य चैत्यगृह आहे. चाळीस खांबांनी सजलेल्या या चैत्यगृहात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत.

चैत्याचा आकार गजपृष्ठाकार आहे. स्तंभांच्या शीर्षभागावर हत्ती, घोडे यांसारखे प्राणी आणि त्यांच्या पाठीवर आरूढ झालेले मिथुन शिल्पं आपलं लक्ष वेधून घेतात. चैत्यगृह पश्चिमाभिमुखी आहे. प्रवेशद्वारावर भव्य सिंहस्तंभ आहे. त्यावरही शिलालेख कोरलेला दिसून येतो. हा स्तंभ आपल्याला अशोकाच्या प्रसिद्ध स्तंभांची आठवण करून देतो.

हा स्तंभ मागं टाकून काही पावलं चालत गेल्यास आपल्याला चैत्यगृहाचा व्हरांडा नजरेस पडतो. हा भाग पूर्णपणे गौतम बुद्ध, बोधिसत्त्व आणि मिथुन शिल्पांनी भरून गेलेला आहे. इथं कोरलेले हत्ती नयनरम्य आहेत.

याच ठिकाणी एक लांबलचक शिलालेख कोरलेला असून त्यात ‘भूतपाल याने जंबूद्वीपातील अप्रतिम लेणीचे निर्माण केले,’ असा उल्लेख वाचावयास मिळतो. गौतम बुद्ध किंवा बोधिसत्त्व पद्मपाणीची प्रतिमा महायान काळात निर्माण केली गेली.

हीनयान आणि महायान यांच्यातील तत्त्वज्ञानाचा फरक आणि त्यामुळं लेणीस्थापत्यात झालेले बदल आपण मागील काही लेखांमधून समजून घेत आहोत. कार्ले लेणी समूहावर महायान तत्त्वज्ञानाचा जबरदस्त पगडा आपल्याला जाणवतो. चैत्यगृहात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूने असलेली भव्य अष्टकोनी स्तंभांची रांग आणि त्याच्या मधोमध कोरलेला स्तूप आपले लक्ष वेधून घेतो.

इथं असणारी सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, स्तूपावर असणारी छत्रावली. गौतम बुद्धांच्या पवित्र अवशेषांचं जतन करण्यासाठी तसेच त्यांची साधना करण्यासाठी स्तूपाची निर्मिती करण्यात आली. लुंबिनी, कुशीनगर, सारनाथ, सांची इ. ठिकाणी असणारे स्तूप आणि त्यामागे असणारा हा संदर्भ आपण भरपूर वेळा ऐकला आहे-वाचला आहे.

लेणीमध्ये कोरलेला स्तूप हा गौतम बुद्धांच्या अस्तित्वाचं प्रतिनिधित्व करतो, अशी मान्यता आहे. या स्तूपाचे अनेक भाग पडतात. स्तूपाच्या अर्धगोलाकृती भागास ‘ब्रह्मांड’ असं संबोधलं जाते. त्यावर असणाऱ्या चौकोनी भागास ‘हर्मिका’ असं म्हणतात. त्यावर सरळ आणि काहीसा काठीसदृश भाग असतो, ज्याला ‘छत्रयष्टी’ म्हणण्यात येतं.

सर्वांत वरच्या भागावर ‘छत्र’ किंवा ‘छत्रावली’ असते. संपूर्ण भारतात कार्ले येथील एकमेव चैत्य आहे, जिथे लाकडात निर्माण केलेले छत्र अजूनही सुस्थितीत आहे. त्यावरील नैसर्गिक रंगात केलेली कलाकुसर सुद्धा अतिशय स्पष्टपणे दिसते.

कार्ले लेणी समूह प्रसिद्ध आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या लेणीमध्ये असणाऱ्या शिलालेखांमधून अनेक राजघराण्यातील व्यक्तींची तसेच यवन (ग्रीक) व्यक्तींची, इतर काही व्यापारी स्त्री-पुरुषांची नावं आपल्याला समजून येतात. पुण्यापासून अगदी जवळच असणाऱ्या भाजे-कार्ले-बेडसे लेणींना अभ्यासपूर्ण नजरेनं भेट देण्याची आणि त्यांच्या खऱ्या इतिहासाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याची गरज आहे.

पुरा-पर्यटन सदरात भारतातील सर्वांत प्रथम धार्मिक वास्तू म्हणून बघितल्या जाणाऱ्या लेणींच्या जन्माची कथा, थेट बिहार ते महाराष्ट्र हा प्रवास, त्यांचे प्रकार आणि त्यांचं असणारं ऐतिहासिक महत्त्व आपण मागील काही लेखांमधून समजून घेतलं.

अशोकपूर्व काळातील अनेक वास्तू किंवा स्थापत्यकीय उदाहरणे उत्खननाच्या माध्यमातून जगासमोर आली आहेत. पण, सुस्थितीत असलेल्या आणि लिखित पुराव्यांच्या आधारे काळाची सुनिश्चिती करता येणाऱ्या वास्तूंची ओळख आपण करून घेतली.

यामुळं विशिष्ट लेणी, तिच्या निर्मितीचा काळ, उद्देश, त्या वास्तूवर असणारा विशिष्ट संप्रदायाचा पगडा आणि त्या माध्यमातून समजून येणारी धार्मिक-सांस्कृतिक परिस्थितीची थोडक्यात पण महत्त्वाची ओळख आपल्याला झाली.

यानंतर महाराष्ट्रात किंवा दख्खन भागात अनेक लेणी निर्माण झाली. पण त्यात सर्वांत उल्लेखनीय आणि अविश्वसनीय भासणारे दोन उदाहरणे आहेत. ज्यांची ओळख आपण पुढील काही लेखांमधून करून घेणार आहोत. त्या ऐतिहासिक वास्तू म्हणजे ‘अजिंठा आणि वेरुळ’.

विश्वामित्रांची तपश्‍चर्या

सकाळ वृत्तसेवा

- विवेक देबरॉय

आतापर्यंत घडलेल्या घटनांचा थोडक्यात आढावा घेऊ. यज्ञात बळी देण्याच्या उद्देशानं राजा अंबरीषानं शुन:शेपाला खरेदी केलं. मुनी विश्वामित्रांना पाहताच शुन:शेपानं त्यांच्याकडं जीव वाचविण्यासाठी विनंती केली. शुन:शेपाच्या ऐवजी तुमच्यापैकी कोणीतरी बळी जावे, अशी विनंती विश्वामित्रांनी त्यांच्या पुत्रांना केली.

मात्र त्या सर्वांनी नकार दिला. ते म्हणाले, ‘‘आपल्या पुत्रांचा त्याग करून इतरांच्या पुत्राचं संरक्षण तुम्ही कसं करू शकता? तुम्ही हे करणं योग्य नाही. हे म्हणजे कुत्र्याचं मांस भक्षण करण्यासारखंच आहे.’’

त्यांच्या या उत्तरानं विश्वामित्र संतप्त झाले आणि म्हणाले, ‘‘तुम्ही अत्यंत मूर्खासारखे बोलला आहात आणि याद्वारे प्रत्यक्ष धर्माचीच निंदा केली आहे. तुमच्या शब्दांमुळं माझा उपमर्द झाला असून हे अत्यंत भयानक आहे. वसिष्ठांच्या पुत्राप्रमाणेच, तुम्ही सर्व जण कुत्र्यांचं मांसभक्षण करणाऱ्यांच्या कुळात जन्म घ्याल. त्याच स्थितीत पुढील एक हजार वर्षे तुम्ही पृथ्वीवर भटकत राहाल.’’

आपल्या पुत्रांना शापदग्ध केल्यानंतर विश्वामित्र शुन:शेपाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. ते त्याला म्हणतात, ‘‘ज्या वेळी तुला वैष्णव वेदीवर पवित्र धाग्यांनी बांधलं जाईल, कपाळावर कुंकू लावलं जाईल आणि गळ्यात माळ घातली जाईल, त्या वेळी अग्नीला उद्देशून मी सांगतो त्या प्रभावी शब्दांचा उच्चार कर.

अंबरीषाच्या यज्ञावेळी, या दोन दैवी ऋचा तू म्हण.’’ शुन:शेपानं त्या दोन्ही ऋचा मुखोद्गत केल्या. तो राजा अंबरीषाकडं गेला आणि म्हणाला, ‘‘हे नृपेंद्रा ! आपण लवकरात लवकर कार्याच्या ठिकाणी जाऊ. तुझं पवित्र कार्य पूर्ण होऊ देत.’’

ऋषिपुत्राचे हे शब्द ऐकताच राजा अत्यंत उत्साही आणि आनंदी झाला. तो तातडीने यज्ञ मंडपात गेला. सहायक पुरोहितांच्या परवानगीनं त्यानं यज्ञपशूला, म्हणजे शुन:शेपाला लाल रंगाचा पोशाख चढविला, त्याच्या अंगावर पवित्र चिन्हं रंगविली आणि वेदीला त्याला बांधलं.

त्या ठिकाणी असं बांधलं असताना, त्या ऋषिकुमारानं दोन ऋचा म्हणत विष्णू आणि इंद्र या दोन देवांना प्रसन्न केले. या स्तुतीनं इंद्र संतुष्ट झाला. त्यानं शुन:शेपाला दीर्घायुष्याचं वरदान दिलं. राजानंही त्याचा यज्ञ पूर्ण केला आणि इंद्राच्या आशीर्वादानं अनेक फळांची प्राप्ती झाली.

विश्वामित्रांनी पुष्कर इथं आणखी एक हजार वर्षे तपश्‍चर्या केली. ही हजार वर्षे पूर्ण झाली. आपली प्रतिज्ञा पूर्ण झाल्यावर या तपस्व्यानं स्नान केलं आणि त्यांनी केलेल्या तपश्‍चर्येचं ईप्सित फळ देण्यासाठी देवांनी तेथे गर्दी केली. तेज:पुंज असलेले ब्रह्मदेव अत्यंत आश्‍वासक शब्दांत त्यांना म्हणाले, ‘‘हे भाग्यशाली ! आपल्या पवित्र कार्याच्या बळावर तू आता ऋषी बनला आहेस.’’ असा आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव स्वर्गलोकात निघून गेले.

यानंतर विश्वामित्रांनी पुन्हा एकदा मोठी तपश्‍चर्या केली. काही वर्षांनंतर स्वर्गातील अप्सरा मेनका तिथे अवतरली आणि पुष्कर कुंडात स्नान करू लागली. त्यांनी तिला पाहिलं, तिचे लावण्य केवळ अतुलनीय होतं आणि दाट नभांमध्ये जणू वीज चमकावी, तशी ती तेजस्वी होती. तिला पाहताच मदनाचा प्रभाव वाढून ते कामपीडित झाले आणि म्हणाले, ‘‘हे अप्सरे !

तुझे स्वागत आहे. तू इथंच, माझ्या कुटीत राहा. माझ्यावर ही अनुकृपा कर. मदनपीडेनं मी अगदी कासावीस झालो आहे.’’ मेनकेनं ते मान्य केलं आणि ती तेथेच राहू लागली. यामुळे विश्र्वामित्रांच्या तपश्‍चर्येमध्ये मोठीच बाधा आली. विश्वामित्रांच्या आश्रमात मेनका अत्यंत आनंदाने दहा वर्षे राहिली.

हा काळ संपल्यावर विश्वामित्रांना स्वत:चीच लाज वाटू लागली. आपल्या नैराश्‍याला दूर करत ते विचार करू लागले. ‘‘माझ्या तपश्‍चर्येचा भंग करण्यासाठी सर्व देवांनी मिळून हे घडवून आणले आहे. दहा वर्षांचा कालावधी एका दिवसासारखा उडून गेला. इच्छा आणि संभ्रम यांनी माझा ताबा मिळविल्याने हा अडथळा आला.’’ त्यांनी उसासा सोडला. ते पुन्हा पुन्हा विलाप करू लागले. हे दृश्‍य पाहून मेनकाही भयभीत होऊन थरथर कापत असल्याचे त्यांनी पाहिले.

ती त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. (शाप मिळण्याची तिला भीती वाटत होती.) मात्र, कौशिकांच्या एका पुत्राने अत्यंत प्रेमळ शब्दांत तिला निघून जाण्याची विनंती केली. यानंतर विश्वामित्र उत्तरेकडील पर्वतांमध्ये (कदाचित हिमालय) गेले.

आपल्या इच्छांवर विजय मिळविण्यासाठी या तेज:पुंज विश्वामित्र ऋषींनी त्यागपूर्ण जीवन जगण्यास सुरुवात केली. कौशिकी नदीच्या किनारी त्यांनी अत्यंत कठोर तपाचरण केले. उत्तरेकडील पर्वतांमध्ये त्यांनी एक हजार वर्षे केलेल्या अत्यंत उग्र तपामुळे प्रत्यक्ष देवही भयभीत झाले. अनेक ऋषी आणि देव एकत्र आले आणि त्यांच्यात चर्चा झाली. राजा कुशिकाच्या वंशातील हा पुत्र ‘महर्षि’ ही मान्यता मिळविण्यास पात्र असल्याचा त्यांनी निर्णय घेतला.

ही देववाणी ऐकताच सर्व विश्‍वाचा पितामह असलेला ब्रह्मदेव अत्यंत मधुर शब्दांत तपस्वी विश्वामित्रांना म्हणाला,‘‘ हे पुत्रा ! हे महर्षि ! तुझे स्वागत आहे. मी तुझ्या कठोर तपाचरणानं प्रसन्न झालो आहे. हे कौशिका ! मी तुला महर्षि म्हणून मान्यता देत आहे.’’ त्यांचे हे शब्द कानावर पडताच तपस्वी विश्वामित्रांनी त्यांना हात जोडून नमन केलं.

ते ब्रह्मदेवाला म्हणाले, ‘‘मी माझ्या पवित्र कार्याद्वारे अतुलनीय पुण्य प्राप्त केले असेल, मी माझ्या वासनांवर विजय मिळविला असेल, तर तुम्ही मला ब्रह्मर्षि असे म्हणावे.’’ ब्रह्मदेव उत्तरला, ‘‘तू अद्यापही तुझ्या वासनांवर पूर्णपणे विजय प्राप्त केलेला नाहीस. त्यासाठी तुला अजून तप करावे लागेल.’’ ब्रह्मदेव स्वर्गात निघून गेले.

अन्य देवही निघून गेले. कृतनिश्‍चयी विश्वामित्रांनी आपले दोन्ही हात उंचावले आणि कोणत्याही आधाराशिवाय तसेच उभे राहत त्यांनी तपश्‍चर्या सुरू केली. ते केवळ वायू भक्षण करू लागले. उन्हाळ्याच्या दिवसांत ते पंचाग्नी बाळगत असत (चार दिशांना चार अग्नी आणि डोक्यावर सूर्य). पावसाळ्याच्या दिवसांत खुलं आकाश हेच त्यांचे छत होते.

हिवाळ्यात हा तपस्वी, दिवस असो वा रात्र, पाण्यातच निद्रा घेत असे. त्यांनी असे उग्र तप एक हजार वर्षे केले. महान विश्वामित्रांची अशी तपश्‍चर्या सुरू असताना वासव आणि इतर देवांना भय वाटू लागले.

यानंतर इंद्राने कौशिकाचा तपोभंग करण्याच्या उद्देशाने रंभा नावाच्या अप्सरेला पाचारण केले. तो म्हणाला, ‘‘रंभे, तुला देवांसाठी अत्यंत कठीण कार्य पार पाडावे लागणार आहे. तुला कौशिकांना आकर्षित करायचे आहे, त्यांच्या मनात वासना निर्माण करायची आहे.’’ हे ऐकून रंभा भयभीत झाली. यानंतर काय घडले, ते पुढील लेखात पाहू या.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

राजवंश भारती : पाल राजवंश

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

गौड वंशाच्या पतनानंतर वंग प्रदेशात जी परिस्थिती निर्माण झाली होती, तिचं वर्णन तत्कालीन साहित्यात ‘मत्स्य न्याय’ असं केलं आहे. मोठा मासा लहान माशाला खातो, तो मत्स्य न्याय. थोडक्यात, बळी तो कान पिळी! अशा वेळी एक अभूतपूर्व गोष्ट घडली. वंगातील काही सुबुद्ध लोकांनी एकत्र येऊन इ. स. ७५० च्या सुमारास ‘गोपाल’ नावाच्या एका कर्तबगार माणसाची राजा म्हणून निवड केली. हा गोपाल कोण, कुठला, त्याचं घराणं कोणतं याची खात्रीलायक माहिती मिळत नाही. (nashik latest article on Pala Dynasty)

गौड राजांच्या पदरी तो होता का, हेही नक्की सांगता येत नाही. पण, ज्या अर्थी एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या, अंदाधुंदीच्या काळात लोकांनीच त्याला निवडले, त्या अर्थी तो चांगलाच लोकप्रिय असला पाहिजे. गो पालाच्या नावातील ‘पाल’ या शब्दावरून त्याचे घराणे ‘पाल घराणे’ म्हणून ओळखले गेले. पुढे तीच एकप्रकारे उपाधी म्हणून प्रत्येक राजाने वापरली. अशा प्रकारे इ. स. ७५० पासून वंग प्रदेशात पाल राजवटीला सुरवात झाली.

पुढचे दोन राजे, धर्मपाल आणि देवपाल हे पाल घराण्यातील श्रेष्ठ राज्यकर्ते होते. त्यांच्या काळात पाल साम्राज्य बरेच विस्तारले. अविभाजित बृहद् बंगाल, बिहारचा, आसामचा आणि नेपाळचा काही भाग एवढ्या भूप्रदेशावर पाल राजांची सत्ता होती. धर्मपाल आणि देवपाल यांचे समकालीन प्रतिस्पर्धी म्हणजे गुर्जर प्रतिहार आणि राष्ट्रकूट राजे. या तीन सत्तांमधे सतत लढाया सुरू होत्या.

पण, एकूण उत्तर भारतावर पाल वंशाचे वर्चस्व कायम होते. धर्मपालाने कन्नोजचे राज्य ताब्यात घेऊन आपला प्रतिनिधी म्हणून ‘चक्रायुध’ याला गादीवर बसवले. तसा उल्लेख खालिमपूरच्या ताम्रपटावर केलेला आहे. नंतर ८७०-७२ च्या आसपास एकाच वर्षात लागोपाठ तीन राजे झाले. त्यातला ‘विग्रहपाल पहिला' हा राजा झाला खरा; पण त्याने लगेच राजपद सोडून संन्यास घेतला. तेव्हापासून पाल साम्राज्याला उतरती कळा लागली.

विग्रहपालाचा मुलगा नारायणपाल चांगली ५५ वर्षे गादीवर होता. पण तो अगदी दुर्बल राजा होता. तसेच पुढचे काही राजे होते. ही परिस्थिती सुमारे १०० वर्षे तशीच होती. इ. स. ९७७ च्या सुमारास ‘महिपाल’ गादीवर आला. त्याने पाल वंशाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. बलाढ्य चोल साम्राज्याच्या राजेंद्र चोलाच्या आक्रमणाला महिपालाने समर्थपणे तोंड दिले. थेट काशीपर्यंत त्याने आपला अंमल बसवला होता. (latest marathi news)

सोमपूर बुद्धविहार, पहाडपूर

सोमपूर बुद्धविहार, पहाडपूरesakal

त्याच्यानंतर साम्राज्याला पुन्हा वाईट दिवस आले. दुसऱ्या महिपालाच्या कारकीर्दीत वरेंद्र या प्रदेशात सम्राटाविरुद्ध मोठे बंड झाले. तिथला कैवर्त समाजाचा एक नायक दिव्यक याने या बंडाचे नेतृत्व केले. ते यशस्वीही झाले. सुमारे ५० वर्षे वरेंद्र स्वतंत्र होते. नंतर इ. स. १०७५ च्या आसपास ‘रामपाल’ या राजाने हे बंड मोडून काढले आणि राज्य पुन्हा सावरले.

ही बंडाची कहाणी आपल्याला कळते, ती एका काव्यातून. रामपालाच्या दरबारात संध्याकर नंदी या नावाचा एक कवी होता. त्याने ‘रामचरितम्’ नावाचे मोठे काव्य रचले. त्याची गंमत अशी, की भगवान श्रीरामाचे चरित्र सांगण्याच्या मिषाने त्याने रूपकात्मक पद्धतीने आपला राजा रामपाल याचे चरित्र सांगितले आहे. या काव्यात कैवर्त बंडाची सगळी हकिगत दिलेली आहे. रामपाल हा पाल वंशातला अखेरचा कर्तृत्ववान राजा.

त्याच्यानंतरचे राजे अगदीच नामधारी होते. पाल वंशात एकूण २२ राजे होऊन गेले. (एका राजाचे नाव चक्क ‘राज्यपाल’ होते!) अखेरचा राजा ‘पालपाल’ होता. काही अभ्यासकांच्या मते २१ वा गोविंदपाल हाच शेवटचा राजा होता. ते मत गृहित धरले, तर पाल वंश सन ११६०-६१ च्या सुमारासच संपला. पालपालाला वंशात धरले, तर सन ११९९-१२०० पर्यंत पाल वंश सुरू होता.

पाल राजे प्रामुख्याने महायान बौद्ध मतवादी होते. सम्राट अशोकानंतर उतरती कळा लागलेल्या बौद्ध धर्माला पाल राजांनी राजाश्रय दिला. अनेक बुद्धविहार त्यांच्या काळात उभे राहिले. नालंदा विद्यापीठाला पाल राजांनी भरघोस देणग्या दिल्या. तेवढेच नव्हे, तर धर्मपालाने, नालंदाची गुणवत्ता घसरते आहे असे बघून विक्रमशिला इथे नवे विद्यापीठ उभारले.

अनेक बौद्ध भिक्ख्खूंना विद्यावृत्ती देऊन थेट तिबेटमधे धर्मप्रसारासाठी पाठवले. पहाडपूर (सध्या बांगलादेशात) इथे उत्खननात सापडलेला ‘सोमपूर बुद्धविहार’ हा पण धर्मपालानेच उभारला होता. पण, या जोडीने पाल राजांनी हिंदू धर्मालाही आश्रय दिला होता. नारायणपाल याचा भागलपूरचा शिलालेख दर्शवतो, की त्याने अनेक शिवमंदिरे बांधली.

सारनाथच्या एका बुद्धविहाराचे नूतनीकरण करताना पाल राजांनी कोरलेला लेख सांगतो, की शंकर व इतर देवतांची शेकडो मंदिरे महिपालाने वाराणशीमध्ये बांधली आहेत. भगवान विष्णू, देवी यांच्या अनेक अप्रतिम मूर्ती पाल राजवटीत घडवल्या गेल्या आहेत. जवळजवळ ४००-४५० वर्षांचा कालखंड गाजवणाऱ्या पाल वंशाची जागा नंतरच्या ‘सेन’ वंशाने घेतली.

सातवाहन कलानुभूती

सकाळ वृत्तसेवा

- दुर्गा आजगांवकर

दक्षिणपथांवरून मौर्यांचं आधिपत्य नाहीसं होताच आंध्रसत्तेची पूर्वेकडून पश्चिमकडं नांदी सुरू झाली. अशातच महाराष्ट्राला भारतीय राजकारणाच्या मानचित्रावर स्थान मिळवून देणारा इतिहास घडत होता. महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठान (सध्याचं पैठण) इथं आपली राजधानी स्थापन करणारा सातवाहन राजवंश हा महाराष्ट्रातला ‘पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश’ म्हणून जन्माला आला.

या वंशाला कोरीव लेखांत ‘सातवाहनकुल’, तर पुराणांत आंध्र किंवा आंध्रभृत्य म्हटलं आहे, म्हणून त्यांच्या उदयकाळाबद्दल विसंगती आहे. मात्र, त्यांचा इतिहास प्राचीन भारतातल्या अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो.    

इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवीसनाच्या तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत भारत खंडाच्या दक्षिण भागावर (दख्खन प्रांत) सातवाहनांनी राज्य प्रस्थापित केलं. या वंशाचा प्रणेता म्हणून ‘सिमुक (श्रीमुख)’ सातवाहन याचं नाव पुराणांत येतं.

त्यासमवेत त्याचा उल्लेख जुन्नरजवळच्या नाणेघाटातल्या लेण्यांमध्ये कोरलेल्या पुतळ्याखालच्या पीठांवर आढळतो. वंशावळरूपी हे आठ पुतळे आता नष्ट झाले आहेत; पण त्यांची नावं अवशिष्ट आहेत. सध्याचं पुणं, नाशिक, नगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत त्यानं सत्ता स्थापन करून प्रतिष्ठान हे राजधानीचं ठिकाण निश्चित केलं.

सातवाहन राजवंशाला साधारणतः तीसेक राज्यकर्ते जवळजवळ ४६० वर्षं सर्वात प्रबळ शासक म्हणून लाभले. सातवाहनांच्या कलेची व्याप्ती स्थापत्य, नाणी, शिलालेख, चित्रकला आणि विविध पुराणांमधून आढळते.

सातवाहनांनी रोमनांबरोबरच्या व्यापारउदीमाला उत्तेजन दिल्यानं शेती, उद्योग यांचं प्रतिबिंब राजकीय कारकीर्दीबरोबरच प्रतिभासंपन्न कलेतही दिसून येतं. तत्कालीन काळाशी संबंधित जे कलेचे प्रकार निर्मिले गेले, त्या कलाविष्कारांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘सातवाहनकला’ असं संबोधलं गेलं.

या संबोधनाला राजकीय संदर्भासह भौगोलिक पार्श्वभूमीही आहे. याच्या देखण्या खुणा म्हणजे पश्चिम भारतात या शासकांच्या कालावधीत निर्मिलेल्या वैभवशाली ‘बौद्धगुंफा’ होत. सातवाहन राजे कृष्ण, गौतमीपुत्र सातकर्णी, पुलुमावी आणि यज्ञश्री सातकर्णी यांनी बौद्ध भिक्षूंकरिता लेणी कोरून घेऊन ग्रामदाने दिल्याचे उल्लेख कोरीव लेखांत मिळतात. 

मौर्यांनी सुरू केलेली ही लेणीपरंपरा सातवाहनांनी पुढं विकसित केली. यामध्ये चैत्य आणि विहार हे नवीनात नवीन. सह्याद्री पर्वतरांगेतल्या कोंडिवते, भाजे, तुळजा, पितळखोरा, कोंडाणे, अजिंठा, नाशिक, बेडसा, जुन्नर, कार्ले, कुडा, महाड, कराड आणि कान्हेरी अशी ठिकाणं सातवाहनांच्या स्थापत्याची साक्ष देतात.

सातवाहनकालीन समजल्या गेलेल्या चैत्यगृहांच्या रचनेत दोन्ही बाजूंना स्तंभांची रांग व मागच्या बाजूला अर्धवर्तुळाकार जागा आहे. तिथं गोलाकार स्तूप आणि त्याभोवती प्रदक्षिणापथ, स्तूपावर हर्मिका व एकावर एक तीन छत्रं, स्तूपाच्या समोर मध्यभागी दरवाजा इत्यादी व त्यावर आत प्रकाश पडावा म्हणून अर्धवर्तुळाकृती मोठं वातायन असे.

त्याच्या आकारावरून त्याला घोड्याच्या नालाची खिडकी (Horseshoe Window) म्हणण्याचा प्रघात पडला. याचं उत्तम उदाहरण म्हणून भाजे इथल्या लेणी सर्वांत प्राचीन आणि प्रतिभासंपन्न समजल्या जातात. भाजे-पितळखोरा-कार्ले ही लेणी शिल्पशैलीच्या दृष्टीनं लक्षणीय आहेत. त्यांत स्त्रीपुरुष नर्तकांची दम्पती व मिथुनशिल्पांचा समावेश आहे.

त्यांतल्या काही चित्रांत गौतम बुद्धांच्या चरित्रातले प्रसंग आणि इतर काहींत जातककथा दाखवल्या आहेत. राजांपासून सामान्य ग्रामिकांपर्यंत विविध श्रेणींच्या आणि औद्योगिक लोकांनी दान देऊन ही लेणी शिल्प-चित्रांनी भूषवली होती, असं काही लेखांवरून समजतं.

भारतातली सर्वांत प्राचीन ऐतिहासिक चित्रं सातवाहनकाळातली आहेत. यांमध्ये अजिंठा गुंफा क्रमांक ९ आणि क्रमांक १० यांचा समावेश होतो. जातककथा हे चित्रांचे मुख्य स्रोत असून गौतम बुद्धांचं जीवन आणि त्यांचं पूर्वजीवन अशा विषयांवरच्या प्रसंगांतून संपूर्ण स्तंभ आणि छत आच्छादलेलं होतं.

त्याचबरोबर फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रतिमा अतिशय कौशल्यानं साकारलेल्या पाहायला मिळतात. ही चित्रं भाजे, अमरावती, सांची आणि जगय्यापेट इथल्या शिल्पांशी, मुद्रा आणि वैशिष्ट्यं यांच्याबाबतीत साधर्म्य बाळगतात.

सातवाहनकालीन लेणी हीनयान पंथांची असल्यामुळं बुद्धमूर्ती अथवा त्यांची शिल्पं आढळत नाहीत; परंतु बौद्धपद, भद्रासन, स्तूप, बोधिवृक्ष आदींमधून त्यांचं अस्तित्व सूचित होतं. त्या काळी यक्षसंप्रदाय प्रचलित असल्यानं यक्ष-यक्षिणींच्या मूर्ती स्तूपांच्या कठड्यांवर कोरलेल्या, भारहूत इथल्या शुंगकालीन स्तूपाशी संलग्न असलेल्या सापडल्या आहेत.

जणू लाकडांमध्ये कोरीव काम करावं इतक्या सहजतेनं दगडावर कोरलेल्या कलाकृती अमरावती, नागार्जुनकोंडा इथं दिसून येतात. कुमारस्वामींनी अमरावती (आंध्र प्रदेश) इथल्या शिल्पकलेचं वर्णन करताना, ‘भारतीय कलेचं अत्यंत विलासी आणि सुकुमार पुष्प’ असं म्हटलेलं आहे. अमरावतीशैली अधिक प्रवाही, जोमदारपणे विकसित झालेली दिसते. सातवाहनांची परंपरा निश्चितच महान आहे. भारतीय कलेतल्या एकात्मतेतून हे सूक्ष्मातिसूक्ष्म साम्य निर्माण झालं असावं यात शंका नाही. 

सातवाहनांचा प्राकृत वाङ्मयालाही उदार आश्रय होता. या काळातल्या हाल नृपतीनं (सतरावा) सातशे गाथांचा निवडक संग्रह ‘गाहा सत्तसई (गाथा सप्तशती)’ या नावानं प्रसिद्ध केला होता. कोट्यवधी गाथांमधून या सातशे गाथा निवडण्यात आल्या असून, त्या विविध दर्जाच्या कवी-कवयित्रींनी रचलेल्या आहेत.

या काळातला दुसरा सुप्रसिद्ध प्राकृत ग्रंथ ‘बृहत्कथा’ हा होय. त्याची इसवीसनाच्या अकराव्या शतकात सोमदेव आणि क्षेमेंद्र यांनी अनुक्रमे केलेली ‘कथासरित्सागर’ आणि ‘बृहत्कथामंजरी’ ही संस्कृत रूपांतरंच सध्या प्रसिद्ध आहेत. 

सातवाहनकालीन कला-इतिहास त्यांच्या नाण्यांवरून अधिक विश्वसनीय स्वरूपात अभ्यासता येतो. सातवाहनांनी तांबं, शिसं, पोटीन आणि चांदी या माध्यमांत नाणी पाडली. त्यातली सर्वांत प्राचीन नाणी नेवासे-पैठण भागाशी संबंधित असून ती ‘हत्ती’ प्रकारची आहेत.

त्यांना ‘कार्षापण’ ही संज्ञा असून नाण्यांवरचे लेख प्राकृत भाषेत आहेत व त्यांत ब्राह्मी व खरोष्ठी या लिपींचा उपयोग दिसतो. सातकर्णीच्या नावानं पाडल्या गेलेल्या अनेक प्रकारच्या नाण्यांवर हत्ती, सिंह, प्राणी, झाड, नंदीपद, स्वस्तिक वगैरेंसारखी चिन्हं आणि सातवाहन घराण्याचं राजचिन्ह म्हणता येईल असं ‘चंद्रकोर-अंकित उज्जैन चिन्ह’ आदी प्रकारविशेष आढळतात.

‘गजलक्ष्मी’ दैवताचं चित्रण आणि जहाज, नौका या छापांची नाणी विशेष उल्लेखनीय आहेत. सातवाहनांच्या नाविकसंबंधांचं आणि सामर्थ्याचं सुस्पष्ट चित्रण यावरून समजतं. चांदीच्या छबीयुक्त नाण्यांवर माहाराष्ट्री आणि दक्षिणी अशा दोन प्राकृत भाषांमधले लेख आहेत. प्रदेशपरत्वे तिथल्या परिचित लिपीत लेख कोरण्याची कला यांतून दिसून येते. सातवाहनकालीन नाणी ही मुख्यत्वे ठशांचा वापर करून तयार केली गेलेली असली तरी प्रारंभीच्या काळातली ‘आहत’ नाणीही ज्ञात आहेत. 

सातवाहन वंशातला एक अत्यंत बलाढ्य आणि थोर राजा ‘गौतमीपुत्र सातकर्णी’ याला दिली गेलेली कोरीव लेखांमधली ‘तिसमुदतोयपीतवाहन’ (ज्याचे घोडे अरबी समुद्र, दक्षिण महासागर आणि बंगालचा उपसागर या तीन समुद्रांचं पाणी प्यायलेले आहेत) ही उपमा सार्थ आहे. त्यावरून त्याच्या राज्यविस्ताराची कल्पना येते.

तत्कालीन रोमन साम्राज्याशी असणाऱ्या व्यापारामुळं कलेला वाव मिळून त्यांतून व्यापारीमार्गांवर कलाकेंद्रे उदयाला आल्याचं दिसतं. या कलांचं राजधानी प्रतिष्ठान हे मुख्य केंद्र होतं. कल्याण, चौल, सोपारा आदी महत्त्वाची सागरी बंदरं आणि जुन्नर, नाशिक, पैठण, तेर (तगर), भोकरदन, कोल्हापूर (ब्रह्मपुरी) ही महत्त्वाची व्यापारीकेंद्रे व राजकीय केंद्रे होती.

या ठिकाणी झालेल्या उत्खननांत काही हस्तिदंती मूर्ती, रोमन मद्यकुंभ (ॲम्फोरा), मणी, दागदागिने, मातीच्या आणि धातूच्या वस्तू, खेळणी, ठसे अशा बऱ्याच कलाकृती मिळाल्या. विशेष म्हणजे, कोल्हापूरमध्ये रोमन धाटणीची (?) समुद्रदेवता, रोमन कांस्य धातूच्या वस्तूंचा साठा, तर भोकरदन व तेर इथल्या उत्खननांत काही हस्तिदंती स्त्रीमूर्ती मिळाल्या.

त्या इटलीतल्या पोम्पेई इथल्या स्त्रीमूर्तींशी साधर्म्य दर्शवतात. याशिवाय, इतरत्र काही रोमन नाणी आणि देवतांचे ब्राँझचे पुतळे सापडले. त्यांवरून, व्यापाराबरोबरच सातवाहन आणि रोमन यांच्यातली कलेमधली देवाणघेवाण स्पष्ट होते. जवळजवळ अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी भारतीय कलाकारांनी घडवलेला हा कलात्मक खजिना पाहिल्यावर मन आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही! 

(लेखिका ह्या चित्रकार व पुरातत्त्व-सहाय्यक संशोधक असून हैदराबाद इथल्या ‘प्लीच इंडिया फाउंडेशन’मध्ये कार्यरत आहेत.)

संक्रमणकाळातली सुंदर लेणी

सकाळ वृत्तसेवा

caves sakal

-केतन पुरी

भाजे आणि कार्ले लेणीसमूहापासून अगदी काही अंतरावर असणारा बेडसे अतिशय महत्त्वाचा आणि स्थापत्यकीयदृष्ट्या आश्चर्यकारक गोष्टींनी परिपूर्ण असलेला लेणीसमूह आहे. खरेतर, पुण्यापासून अगदीच जवळ असल्यामुळं बरेच भटके आणि पर्यटक कार्ले, भाजे आणि बेडसे लेण्या एकाच दिवसात किंवा कोणत्याही दोन लेण्या एकाच वेळेस पाहण्यावर भर देतात. अर्थात, त्यात वावगं असं काही नाही.

परंतू यामुळं लेण्यांच्या एकूण रचनेची आणि तत्कालिन स्थापत्य प्रयोगांची जाणीव आपल्याला चटकन होत नाही. पश्चिम दख्खन भागात तयार करण्यात आलेल्या सर्वात पहिल्या लेण्यांपैकी एक म्हणून भाजे लेण्यांची माहिती आपण मागील लेखात घेतली होती. हीनयान संप्रदायाच्या काळात या प्रदेशामध्ये अनेक लेण्या निर्माण करण्यात आल्या. त्यात पितळखोरा आहे, जुन्नर जवळ असणारी तुळजा लेणी आहे, ठाणाळे आहे, कोंढणे आहे, कोंडीवटे आहे, कान्हेरीमधील काही लेण्या आहेत. हे सर्व घडत असताना बौद्ध धर्मात फार मोठी धार्मिक उलथापालथ सुरु होती. हीनयान संप्रदायाची जागा ‘महायान’ नामक संप्रदायानं घेण्यास सुरुवात झाली होती. काहीसे कर्मठ आणि मूर्तिपूजनात विशेष रस असणारे हे तत्त्वज्ञान जनसामान्यांच्या समोर सक्षम पर्याय म्हणून उभे राहिले. त्यातून गौतम बुद्धांच्या प्रतिमांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. गौतम बुद्धांचे प्रतिरूप समजल्या जाणाऱ्या स्तूपांच्या समोरील बाजूस बुद्धमूर्ति कोरल्या जाऊ लागल्या. लेणी स्थापत्यात अनेक बदल झाले. हीनयान ते महायान असा प्रवास होत असतानाचा जो संक्रमणाचा काळ होता, त्या काळात एका अतिशय सुंदर लेणीसमूहाची निर्मिती झाली. ती ही बेडसे येथील लेणी.

साधारण तीनचारशे पायऱ्या चढून गेल्यावर लेणीच्या मुख्य परिसरात आपण प्रवेश करतो. ही अरण्यक प्रकारातील लेणी आहे. इथं राहणाऱ्या बौद्ध भिक्खुंना शांततेत ईश्वराची आराधना करण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या व्रताची पूर्तता करण्यासाठी या लेण्यांची निर्मिती प्रामुख्यानं झाली असावी, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. पायऱ्या चढून गेल्यावर आपण थेट सात क्रमांकाच्या लेणीसमोर उभा राहतो. संपूर्ण भारतात ही एकमेव चैत्य लेणी आहे, ज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी अरुंद अशा कातळात खोदलेला रस्ता आहे. चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन पूर्ण आणि दोन अर्धस्तंभांची रचना केलेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, एवढे भव्य आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कातळ खोदून खांब तयार करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा, असे अभ्यासक सांगतात.

या स्तंभांच्या शीर्षावर अशोकच्या स्तंभशीर्षाप्रमाणे उलट्या कमळाची रचना करण्यात आली आहे. त्यावर हत्ती, नीलगाय, घोडे, बैल यांसारखे प्राणी आणि त्यांच्यावर आरूढ युगुल आपल्याला आढळतात. मुख्य प्रवेशद्वार आणि खांबाच्या मध्ये काहीशी मोकळी जागा सोडलेली आहे, जिथे दोन्ही बाजूंच्या भिंतींवर एकावर एक चैत्यगवाक्षांची रचना केलेली आहे आणि काही छोट्या खोल्यासुद्धा खोदल्या आहेत. या सर्व गोष्टी पहिल्यांदाच लेणीस्थापत्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस चैत्य गवाक्ष आहे. आतील चैत्य इतर चैत्यगृहाप्रमाणेच गजपृष्ठकार आहे. स्तूपाची रचनासुद्धा अगदीच सारखी आहे. स्तूपाच्या बाजूस काही खांबांवर कमळ, त्रिरत्न, धम्मचक्र सारख्या अनेक गोष्टींचे अंकन केले आहे. ही शुभचिन्हे मानली जातात.

या चैत्याच्या उजव्या बाजूला असणारी लेणी क्रमांक ११ अशीच दुर्मिळ स्थापत्य असलेली लेणी आहे. हे एक विहार आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या लेण्यांमध्ये प्रामुख्यानं विहारांची रचना ही चौकोनी किंवा आयताकृती केल्याचं पाहायला मिळतं. परंतू बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या विहाराची रचना अगदीच चैत्यगृहासारखी आहे, गजपृष्ठकार. खरेतर, इथेही चैत्य बनवण्याचा विचार असावा. परंतू काही अशुभ वाटणाऱ्या घटना घडल्यामुळे किंवा ऐनवेळी निर्माण झालेल्या काही अपरिहार्य परिस्थितीमुळे चैत्य बनवण्याचा विचार अर्धवट सोडून देण्यात आला असल्याचे आपल्याला जाणवते. नंतर या चैत्यगृह बनवण्यासाठी खोदण्यात आलेल्या लेणीस विहारामध्ये रूपांतरित करण्यात आले.

एकूण नऊ खोल्यांची रचना असणारा हा विहार वैशिष्ट्यपूर्ण आहे. छोट्या खोल्यांच्या प्रवेशद्वारावर चैत्य कमान तर आतील बाजूस बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी केलेली व्यवस्था दिसून येते. लेणीच्या मधोमध एका स्त्री देवतेच्या प्रतिमेचं अंकन करण्यात आलं आहे. हे फार पुरातन नसून उत्तर मध्ययुगीन काळ किंवा त्यानंतर कधीतरी हे करण्यात आलं असावं. इ. स. १८६१ या वर्षातल्या नोंदीवरून या लेणीची सातत्यानं देखभाल घेतल्याचे संदर्भ आपल्याला वाचावयास मिळतात. कदाचित त्याचकाळात ही देवी याठिकाणी अंकित करण्यात आली असावी. अर्थात, हा केवळ अंदाज. आज स्थानिक परिसरातील गावकरी या देवीला ‘सटवाई’ नावानं ओळखतात व तिची पूजाअर्चा करतात.

ही एका भल्यमोठ्या धार्मिक स्थित्यंतराच्या-संक्रमणाच्या काळात निर्माण झालेली लेणी आहे. पुढे कार्ले, कण्हेरी किंवा अजंठा, छ. संभाजीनगर येथील लेण्याची रचना किंवा स्थापत्यकीय घटकांचे केलेले विशेष प्रयोजन पाहता बेडसे अतिशय महत्त्वाची आणि नव्या गोष्टींच्या निर्मितीस कारणीभूत ठरणारी लेणी आहे. सातवाहन काळात म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकात ही लेणी निर्माण करण्यात आली. सातवाहन कालीन कलेचा महत्त्वाचा घटक म्हणून या लेण्यांकडे पाहायला हवे.

पवना धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारी बेडसे लेणी दोन हजार वर्षांपूर्वी अशा बौद्ध भिक्खूंकडून वापरण्यात यायची, ज्यांचा इतर जगाशी अन्न गोळा करण्यापलीकडं फारसा संबंध नसायचा. ही अलिप्ततेची परंपरा आजही कायम आहे. आपल्या उदरात अनेक रहस्ये, अनेक विस्मयकारक गोष्टी आणि एका सांस्कृतिक-सामाजिक-धार्मिक आणि स्थापत्यकीय उलाढालीच्या खाणाखुणा जपत बेडसे आजही आपले एकांतवासाचं अस्तित्व टिकवून आहे.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

मुघल संस्कृतीची साक्ष

अवतरण टीम

- विशाखा बाग

सौंदर्याने नटलेला; पण पर्यटकांमध्ये फारसा परिचित नसलेला उझबेकिस्तान देश लालबहादूर शास्त्री यांच्यामुळे भारतीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडा मोठ्या असलेल्या उझबेकिस्तानमध्ये अनेक निसर्गरम्य ठिकाणं आहेत. आजूबाजूला संपूर्ण बर्फाच्छादित डोंगर आणि समोर शांत स्वच्छ तलावातील पाणी... अजून काय लागतं आपल्याला मनःशांतीसाठी? ऐतिहासिक घटनांबरोबरच मुघल संस्कृतीची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती असं सर्व काही इथे बघायला मिळतं...

उझबेकिस्तानच्या या ट्रीपमध्ये लालबहादूर शास्त्री जिथे अनंतात विलीन झाले ते हॉटेल आणि त्याचबरोबर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तेथील सरकारने उभा केलेला पुतळा हे दोन्ही पाहण्याची संधी मिळाली. पर्यटनाबरोबरच शास्त्रींबद्दलचा अभिमान आणि आदर पुन्हा एकदा अनुभवयास मिळाला. शहरात मध्यवर्ती ठिकाणी हा पुतळा असल्यामुळे भेट देण्यास सोपा आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला छोटी बाग आहे आणि या रस्त्यालासुद्धा लालबहादूर शास्त्रींचं नाव देण्यात आलेलं आहे.

आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडा मोठ्या असलेल्या उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद या राजधानीशिवाय समरकंद, बुखारा आणि फरगाना व्हॅली यांसारखी महत्त्वाची गावं बघण्यासारखी आहेत. त्यामध्ये चार्वाक तलाव, चिमग्यान हा बर्फाच्छादित डोंगर, सुंदर कलाकुसरीच्या वस्तूंनी, खाद्यपदार्थांनी, फळांनी आणि मसाल्यांनी भरलेले स्थानिक बाजार आणि मुघल संस्कृतीची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती असं सर्व काही बघायला मिळतं. ऐतिहासिक घटनांबरोबर पुरातन संस्कृतीची साक्ष आणि आधुनिकतेचा साक्षात्कार असे सर्व काही तुम्हाला इथे बघायला मिळेल.

ताश्कंद विमानतळावरून उतरून हॉटेलमध्ये जाईपर्यंत जेवढी गावं बघितली ती नक्कीच आवडण्यासारखी होती. मोठे रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक, ठिकठिकाणी बागा, भव्य इमारती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे सगळं ताश्कंदमध्ये बघायला मिळत होतं. अतिशय पुरातन असा वाहतुकीचा आणि व्यापाराचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा सिल्क रोड ताश्कंदजवळूनच जात होता आणि त्यामुळेच हजारो वर्षांपासून जागतिक पटलावर ताश्कंदचे महत्त्व आहेच.

इस्लामिक आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या उझबेकिस्तानमध्ये त्याची साक्ष देणाऱ्या आणि सुंदर कलाकुसर असलेल्या मोठ्या मशिदी अन् मदरसे बघायला मिळतात. ताश्कंदमध्ये हजरत इमाम कॉम्प्लेक्स बघण्यासाठी आम्ही गेलो. इस्लाम धर्माबरोबरच बाकीच्यांनासुद्धा इथे येण्यास परवानगी आहे. या कॉम्प्लेक्समध्ये दोन-तीन छोट्या मशिदी आणि मदरसे बघायला मिळाले.

त्याचबरोबर संपूर्ण संगमरवरी बांधकाम असलेली आणि बऱ्यापैकी नवीन असलेली मिनार मशीदसुद्धा आम्ही बघितली. कालव्याच्या पाण्यालगत असलेल्या या मशिदीचा परिसर भव्य आणि शांत वाटत होता. स्थानिकांसह देशोदेशीच्या पर्यटकांचीही गर्दी इथे होत होती.

ताश्कंदपासून साधारण दीड तासाच्या अंतरावर चिमग्यान हा बर्फाच्छादित पर्वत आहे. रॉक क्लाईंबिंग, माऊंटेनिंग, पॅराग्लायडिंग इत्यादींसारखे साहसी खेळ या पर्वतावरून खेळता येतात. वर जाण्यासाठी चेअर कारची सुविधा आहे; वर पोहोचल्यावर आजूबाजूचं चित्र अतिशय निसर्गरम्य आणि आकर्षक दिसत होतं. लांबच लांब बर्फाच्छादित डोंगर आणि चार्वाक लेकसुद्धा तुम्हाला इथून बघायला मिळतो.

इथून उतरल्यानंतर आम्ही चार्वाक लेक बघण्यासाठी गेलो. या तलावाचं पाणी अतिशय स्वच्छ आणि निळं आहे. मला इथे गेल्यानंतर आपल्या लेह येथील पँगाँग लेकची आठवण झाली. आजूबाजूला संपूर्ण बर्फाच्छादित डोंगर आणि समोर शांत स्वच्छ तलावातील पाणी... अजून काय लागतं आपल्याला मनःशांतीसाठी? इथून निघाल्यानंतर अजूनच ताजेतवाने झाल्यासारखं वाटलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ताश्कंदहून समरकंदला जाण्यासाठी आम्ही बुलेट ट्रेन पकडली. सेंट्रल एशियामधलं सर्वात जुनं गाव म्हणून समरकंदला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. समरकंद हे उझबेकिस्तानमधलं तिसरं मोठं शहर. त्याचबरोबर गेल्या अडीच हजार वर्षांपासून चीन आणि मध्य एशिया यांना जोडणाऱ्या सिल्क रोडवरचं एक महत्त्वाचं उद्योग केंद्र आणि व्यापार पेठ म्हणूनसुद्धा नावारूपाला आलेलं आहे.

रेगिस्तान म्हणजेच एक मोठा चौक हे महत्त्वाचं पर्यटन केंद्र समरकंदमध्ये बघायला आम्ही गेलो. आता या ठिकाणी तीन मोठे मदरसे आहेत. पर्शियन आर्किटेक्चरची साक्ष देणाऱ्या या मोठ्या इमारतींची दारं वेगवेगळ्या रंगीत टाइल्स, दगड आणि मिनार कामाने अन् चबुतऱ्यांनी सजवलेली आहेत. हजारो वर्षांपूर्वी या ठिकाणी गावातली महत्त्वाची बाजारपेठ होती आणि इथूनच पुरातून सिल्क रोडवरचा व्यापार होत असे.

इथूनच जवळ १३ किलोमीटरवर असलेल्या कोनिगिल या गावात आम्ही हॅण्डमेड पेपर फॅक्टरी बघण्यासाठी गेलो. तिथे हॅण्डमेड पेपर कसा बनवला जातो याचं संपूर्ण प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आमच्यासाठी येथीलच एका मोठ्या घरात स्थानिक जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. घरातल्या सदस्यांनी स्थानिक उझबेकी आणि पर्शियन पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ जेवणात केले होते.

मांसाहारासह शाकाहारी पदार्थ आणि वेगवेगळ्या सॅलॅड्सवरही इथे भर देण्यात आला होता. इथून मग आम्ही गुरे मिझोलियन बघण्यासाठी गेलो. तुर्की मंगोलियन बादशाह तैमूर याची ही कबर आहे. हेसुद्धा एक महत्त्वाचं पर्यटनाचं केंद्र आहे. इसवी सन १४०० मध्ये बांधलेल्या या इमारतीवर मुघल आणि पर्शियन संस्कृतीची अन् आर्किटेक्चरची छाप बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसून येते.

त्यानंतरच संपूर्ण आशियामध्ये मुघलांकडून अशा प्रकारच्या अनेक मोठ्या नावाजलेल्या इमारती बांधण्यात आल्या. ज्यामध्ये दिल्लीतील हुमायूनची कबर आणि आग्र्यामधील ताजमहाल यांचासुद्धा समावेश होतो. त्यानंतर आम्ही प्रसिद्ध अशा समरकंदच्या सियाब बाजारामध्ये फिरण्यासाठी गेलो. स्थानिकांसह देश-विदेशातल्या पर्यटकांसाठी हा बाजार म्हणजे त्यांचं अतिशय आवडीचं खरेदीचं ठिकाण.

त्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांसह वेगवेगळ्या प्रकारचे नान, ब्रेड, फळं, मिठाई, मसाले, सुका मेवा, गालिचे, वेगवेगळी कलाकुसर आणि एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, जॅकेट्स आणि घर सजावटीच्या वस्तू अशा एक न अनेक गोष्टी मनपसंत दरात खरेदी करायला मिळतात. आमचे दोन-तीन तास तिथे कसे गेले हे कळलेसुद्धा नाही. भारतीय पर्यटकांनी आता सरधोपट मार्ग न स्वीकारता चोखंदळ ठिकाणी जाऊन पर्यटनाची आवड पूर्ण करायला नक्कीच हरकत नाही, असा हा देश आहे.

gauribag7@gmail.com

(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

वैभव दोन हजार वर्षांपूर्वीचं...

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय किल्ल्यांच्या यादीत अग्रेसर असलेल्या राजमाची किल्ल्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. लोणावळ्याच्या जवळ असणाऱ्या राजमाची किल्ल्यावर पर्यटकांची ये-जा सुरूच असते. श्रीवर्धन आणि मनरंजन या दोन बालेकिल्ल्यांची जोडी कित्येक दशकांपासून साहसी गिर्यारोहक, पर्यटक, भटक्यांना खुणावत आहे.

राजमाची किल्ल्याच्या उतारावर असणाऱ्या १६ लेणींचा समूह या परिसराचा इतिहास तब्बल दोन हजार वर्षांपर्यंत मागं घेऊन जातो. हा लेणीसमूह ‘कोंढाणे लेणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन व्यापारी मार्गावर निर्माण करण्यात आलेल्या या लेणी अनेक पांथस्थांना आश्रय देण्याचं मोठं काम करणाऱ्या ठरल्या आहेत. या लेणींना जाण्यासाठी दोन मार्ग आज उपलब्ध आहेत.

पहिला, लेणीच्या पायथ्याला असणाऱ्या गावात गाडी लावून, काही मिनिटांची चढण पार करून आपण लेणी परिसरात पोचू शकतो. तर, राजमाची किल्ल्याच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यानं साधारण अर्ध्या-पाऊण तासाचा डोंगरातील रस्ता उतरून आपण या ठिकाणी जाऊ शकतो. मुंबई किंवा पुण्यातून येणारे बरेच पर्यटक हा दुसरा मार्गच बऱ्याच वेळा पसंत करतात.

या लेणीसमूहाच्या अलीकडंच एका लहान ओढ्यावर आपल्याला दगडात एकाच ओळीत खोदलेल्या चौकोनी खाचा दिसतात. प्राचीन काळात वाहत्या पाण्यावर लाकडी बंधारा बांधून पाणी अडवण्यासाठी केलेली सोय आपल्याला दिसते आणि आपण लेणीच्या मुख्य परिसरात प्रवेश करत असल्याची जाणीव होते. इथं असणाऱ्या १६ लेणींपैकी लेणी क्रमांक एक आणि दोन महत्त्वाच्या आहेत. पहिल्या क्रमांकाची लेणी चैत्यगृह आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची लेणी विहार आहे.

चैत्यगृह वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींनी संपन्न आहे. चैत्यकमान आज पूर्णपणे ढासळली असली किंवा तिची पडझड झालेली असली, तरीही आता असलेल्या अवशेषांवरून ती भव्य असावी याचा अंदाज येतो. अभ्यासकांच्या मते, चैत्याच्या प्रवेशद्वारावर असणारी चैत्यकमान ही लाकडामध्ये तयार केली असावी. लाकडांना भिंतीमध्ये व्यवस्थित बसवण्यासाठी केलेली दगडी खाचांची रचना या निरीक्षणाला पुष्टीच देणारी आहे.

या कमानीच्या आजूबाजूला अनेक स्त्री व पुरुषांच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या लेणीत सातवाहनकालीन कलेचं दर्शन आपल्याला घडतं. तत्कालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिस्थितीची पुसटशी कल्पना याच लेणींच्या कलाकृतीमधून आपल्याला येते. हीनयान संप्रदायाचा प्रभाव एकूणच लेणीस्थापत्यावर पाहायला मिळतो.

या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर आपल्याला एका यक्षाची प्रतिमा पाहायला मिळते. आज ही प्रतिमा पूर्णपणे नष्ट झालेली आहे. फक्त एक कान आणि त्यावर असणारा शिलालेख सुस्थितीत आहे. हा ‘शंकूकर्ण’ यक्ष असून, त्याच्या बरोबर चेहऱ्याच्या समोर एका दात्याचे, बलकेन नामक व्यक्तीचं नाव वाचावयास मिळतं. अशाप्रकारे चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूस शिल्पांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात अंकन करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे अभ्यासक सांगतात.

चैत्यगृहाची रचना गजपृष्ठाकार आहे. पण या लेणीची सध्याची अवस्था अतिशय विदीर्ण आहे. स्तूप बऱ्यापैकी ढासळला आहे. खांब पडले आहेत. अलीकडच्या काळात लेणीच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे. पण हा ऐतिहासिक वारसा अनेक कारणांमुळं नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या चैत्याच्या बाजूलाच मोठे विहार आहे. विहारातील खोल्यांच्या प्रवेशद्वारावर चैत्यकमान असून खोल्या फारच लहान आहेत.

या विहाराच्या एका भिंतीमध्ये छोट्या स्तूपाची रचना केली आहे. तिथं राहणाऱ्या एखाद्या महत्त्वाच्या बौद्ध भिक्खुचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ या स्तूपाची निर्मिती झाली असावी. हा स्मृती स्तूप प्रकारातील असावा, असं अभ्यासक सांगतात. स्थापत्याचा विचार करता, हे सर्वांत पहिलं विहार आहे ज्यामध्ये स्तंभांचा वापर करण्यात आला आहे. उर्वरित लेणींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.

इथल्या पाण्याच्या टाक्यांमध्येही शेकडो वर्षांपासून गाळ जमा होत आहे. ही लेणी महाराष्ट्र किंबहुना दख्खन भागातील लेणी स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. पश्चिम दख्खन भागात किंवा भारतभरात निर्माण करण्यात आलेल्या सर्वांत सुरुवातीच्या लेणींमधील एक असणारी कोंढाणे लेणी आज दुर्लक्षित अवस्थेत आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

२०१९ च्या मार्च महिन्यात काही मित्रांसोबत राजमाची किल्ला पाहायला गेलो होतो. किल्ला पाहून दुसऱ्या दिवशी कोंढाणे लेणी पाहण्यासाठी जायचं, असं ठरले. राजमाचीच्या मागील बाजूनं असणाऱ्या डोंगरवाटेवरून आम्ही सगळे खाली उतरू लागलो. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आम्हाला एक सपाट मैदान लागले. तिथून दोन रस्ते खाली उतरत होते.

आम्ही उजव्या बाजूला एका खोदीव टाक्याच्या बाजूनं उतरण्याचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय चुकीचा होता. डाव्या बाजूनं खाली गेल्यास अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात लेणींजवळ पोचता येत होतं. पण आम्ही उत्साहात दुसऱ्या रस्त्याकडं लक्ष न देता उजव्या बाजूनं खाली उतरलो. ती घळीची वाट होती. अतिशय कष्टानं खाली उतरल्यावर रस्ता चुकल्याची जाणीव झाली.

पुन्हा एकदा वर चढून त्या मधल्या मोकळ्या टप्प्यावर गेलो. तिथे रेंज आल्यावर काही मित्रांना फोन केले. तेव्हा समजलं, की डाव्या बाजूनं उतरायचं होतं. तोवर आमच्याकडील पाणी संपलं. पण उत्साहाच्या भरात ही गोष्ट लक्षात आली नाही. खाली उतरून लेणी पाहिल्या. विश्रांती घेतली. पण परतीच्या प्रवासात राजमाचीची चढण चढत असताना सूर्य डोक्यावर आलेला होता. पाणी सोबत नसल्यामुळं आणि पानगळ झाल्यामुळं फारशी सावली नव्हती.

अतिशय कष्टानं सर्व जण चढत होते. त्यात पाण्याची मात्रा कमी झाल्याने त्रास जाणवायला लागला. मित्रांच्या मदतीने सर्व जण कसेबसे राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो. पण या चढणीत तब्बल दोन-अडीच तास गेले. त्यामुळे कोंढाणे लेणी राजमाचीच्या बाजूनं जाण्याचा विचार करत असाल, तर माहितगार माणूस सोबत घेणं कधीही उत्तम. अन्यथा कर्जत स्टेशनवरून सात-आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोंढाणे गावात गाडी पार्क करून काही मिनिटांची चढण पार करणं हा सोपा पर्याय उपलब्ध आहेच.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

गांधारशैलीची अमूल्य भेट

सकाळ वृत्तसेवा

- प्रतिभा वाघ, plwagh55@gmail.com

गांधारकला म्हणजे सम्राट कनिष्क आणि त्यानंतरचे कुशाण वंशाचे सम्राट यांची अधिकृत दरबारी कला होय. वर्तमानकाळातल्या अफगाणिस्थानची राजधानी काबूल म्हणजेच महाभारतकालीन गांधार! कौरवांची माता गांधारी ही या गांधार देशाची राजकन्या होती. इसवीसनपूर्व पहिलं ते पाचवं शतक हा काळ प्राचीन भारतातल्या गांधार देशातल्या कलेच्या भरभराटीचा काळ होता.

अनेक राजवंशांनी या प्रदेशावर सत्ता गाजवली. या काळात ग्रीक कलाकार, रोमन व्यापारी यांच्याशी संबंध आल्यामुळे, त्यांच्या कलेचा प्रभाव आपल्या कलेवर पडला. त्यामुळं वास्तुकलेत संमिश्र वास्तुशैली उदयास आली. मूर्तिकलेत ग्रीक बौद्धशैली निर्माण झाली. भारतीय लक्षणं आणि प्रमाणबद्ध, डौलदार शरीर ही ग्रीक कलेची वैशिष्ट्यं या दोहोंतून मनोहारी बुद्धमूर्ती निर्माण झाल्या. भारतीय लक्षणं म्हणजे पारंपरिक मुद्रा, पोशाख, हावभाव देवत्वनिर्देशक चिन्हं होत.

स्वतःची मूर्ती घडवण्यास गौतम बुद्धांचा तीव्र विरोध होता. हिनयान पंथ आणि महायान पंथ हे दोन पंथ बौद्धधर्मात निर्माण झाले. हिनयानपंथीय हे रिकामं सिंहासन, बोधिवृक्ष, धम्मचक्र, कमळ, बुद्धांची पदचिन्हं या प्रतीकांद्वारे गौतम बुद्धांचं अस्तित्व दर्शवत असत. सांचीचा स्तूप, भारहुतचा स्तूप इथं याच प्रतीकांद्वारे बुद्ध दिसतात.

बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर ग्रीकांच्या अपोलो देवतेच्या सुंदर रूपानं भारतीय मूर्तिकारांना भुरळ घातली आणि महायानपंथीयांनी बुद्धांचा मूर्तिरूपात कलात्मक आविष्कार करण्यास उत्तेजन दिलं. बुद्धांचे जीवनविचार, खरं जीवन या संकल्पनांची कलात्मक निर्मिती होऊ लागली. हे सारं घडलं इसवीसनपूर्व चौथ्या दशकात सिकंदराच्या विजयानंतर.

सिंहासनाधिष्ठित अर्धोन्मीलित नयनांनी ध्यानस्थ अवस्थेत बसलेली विलोभनीय बुद्धमूर्ती ही गांधारशैलीनं दिलेली अमूल्य भेट म्हणावी लागेल. तक्षशिला, पुष्कलावती इथली मंदिरं, मठ यांच्या अवशेषांवरून गांधार वास्तुकलेची कल्पना येते. अनेक मजल्यांचे उंच स्तूप या काळात उभारले गेले.

यात ग्रीक पद्धतीच्या अर्ध्या स्तंभाची रचना इथं दिसते. या अवशेषांत कॉरिन्थिअन प्रकारची स्तंभशीर्षं सापडली आहेत. ग्रीक, इराणी आणि रोमन कलांचा प्रभाव या वास्तुकलेवर आढळतो.

गांधारकलेच्या वैशिष्ट्यांचा विचार करता गांधारात चित्रकलेचे नमुने उपलब्ध झाले नाहीत. इतर दुय्यम कला म्हणजे सुवर्णालंकार, थाळ्या, पेले, सोन्याचे ताईत, रत्नजडित रक्षाकरंडक या आहेत.

गांधारकलेत शिल्पावशेष फार मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. शिल्पांचे विषय भारतीय व प्रामुख्यानं बुद्धांच्या जातककथा, जीवनातले प्रसंग, बुद्ध व बोधिसत्त्व यांच्या मूर्ती हे आहेत.

प्रवाही आणि लयदार झुबक्यांच्या द्वारे केलेलं केसांचं शिल्पांकन, अंगावर घेतलेलं वस्त्र, त्याच्या त्रिमितयुक्त चुण्या यांद्वारे या मूर्तींवर असलेला ग्रीक-रोमन कलेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. मानवी स्वरूपातल्या या मूर्तींना देवत्व आणण्यासाठी तृतीय नेत्र किंवा दोन भुवयांमधलं उर्णा हे चिन्ह, कानाची खाली लोंबणारी पाळी, डोक्याच्या मागं प्रभावलय, तळहात-तळपाय यांवरील चक्र, त्रिशूल ही सामुद्रिक लक्षणं, हाताच्या पारंपरिक मुद्रा या भारतीय लक्षणांबरोबर ‘उष्णिशा’ ही अपोलो या ग्रीक देवाच्या मूर्तीत आढळणारी गाठ डोक्यावर बांधलेली आढळते.

बुद्धांचं दर्शन या शैलीत योग्याच्या स्वरूपात घडवण्यात आलेलं आहे, तर बोधिसत्त्वांच्या मूर्तीवर राजबिंडा पोशाख व अलंकार आणि विशेष म्हणजे, भरदार मिश्या कोरलेल्या दिसतात; ज्या भारतीय शिल्पांत आढळत नाहीत. बोधिसत्त्व म्हणजे ज्या व्यक्तीच्या अंगी ‘बोधी’ - म्हणजे पूर्ण ज्ञान प्राप्त करून घेण्याची पात्रता- असते अशी व्यक्ती. गौतम हे बुद्ध होण्यापूर्वी बोधिसत्त्वच होते.

गांधार शिल्पांत अनेक नवीन माध्यमं वापरली गेली आहेत. सुभाजा (शिस्ट) दगड प्रामुख्यानं वापरण्यात आलेला आहे. हा निळसर करड्या रंगाचा आणि काहीसा मऊ असतो. त्याशिवाय चुनखडीचा दगड (लाईम स्टोन), टेराकोटा (भाजलेली माती) आणि स्टक्को प्लॅस्टरचा उपयोग, साचा बनवून अनेक प्रती काढण्यासाठी नंतरच्या काळात झाला.

त्यामुळं बुद्धशीर्षाचे अनेक विलोभनीय नमुने पाहायला मिळतात. हे चेहरे यौवनपूर्ण, मोहक असून मुखावरचे भाव गंभीर आहेत. भुवया, अर्धोन्मीलित डोळे, ओठ, तसंच कपाळावरच्या केसांच्या बटा अतिशय रेखीव आहेत. कानाची लांब पाळी, ‘तिसरा डोळा’ सूचित करणारं दोन भुवयांमधलं उर्णा हे चिन्ह ही देवत्व सुचवणारी चिन्हं आहेत.

आदर्शवादी चेहरा, लयबद्ध केसांची प्रवाही रचना आणि वर उल्लेखिलेले चेहऱ्याचे तपशील हे ग्रीक-रोमन कलेचा प्रभाव दर्शवतात. गांधारशैलीविषयी लिहिताना, उत्तरमध्य अफगाणिस्थानातल्या बामियान इथल्या प्रचंड बुद्धमूर्तींचा उल्लेख अत्यावश्यक. इथं अतिमानवी स्वरूपातल्या दोन बुद्धमूर्ती होत्या. तालिबान्यांनी २००१ मध्ये स्फोटांद्वारे या मूर्तींचा विध्वंस घडवून आणला.

शाक्यमुनींची पूर्वेकडची मूर्ती १२० फूट उंचीची होती, तर पश्‍चिमेकडच्या कोनाड्यातली १७५ फूट उंचीची बुद्धमूर्ती ही गांधारशैलीतल्या बुद्धमूर्तीची अतिप्रचंड प्रतिकृती वाटत असे. मात्र, या दोन्ही मूर्ती घडवण्याचं तंत्र खूप भिन्न आहे. संपूर्ण दगडात शरीर व डोकं यांचा खडबडीत आकार कोरून व मातीत गवताचे तुकडे मिसळून ते मिश्रण घोटून घोटून चेहऱ्याचे अवयव, तसंच वस्त्रं घडवण्यात आलं. वस्त्राच्या चुण्या दाखवण्यासाठी मूर्तीच्या दोन्ही बाजूंना भिंतीत लाकडी खुंट्या ठोकून त्यांना दोरखड बांधण्यात आलं आणि मातीच्या मिश्रणानं लिंपून वस्त्राच्या घड्या दाखवल्या गेल्या.

त्यानंतर ते सुकू देण्यात आलं व नंतर गुळगुळीत करून त्यावर सोन्याचा वर्ख इतक्या सुंदर पद्धतीनं लावण्यात आला की चिनी प्रवासी ह्यूएनत्संग यानं ‘धातूच्या मूर्ती’ असा या मूर्तींचा उल्लेख, आपल्या भारतभेटीच्या नोंदीमध्ये, केला आहे.

राजाच्या वेशातली, ओठावर मिश्या असलेली, प्रौढ चेहऱ्याची बोधिसत्त्वाची उभी मूर्ती अमेरिकेतल्या बोस्टन कलासंग्रहालयात आहे.

‘गौतम बुद्धांचं महानिर्वाण’ हे लॉरिया तांगाई इथलं उत्थित शिल्प त्याच्या वास्तववादी शिल्पांकनामुळं लक्षात राहावं असं. मानवी स्वरूपातल्या बुद्धमूर्ती ही गांधारशैलीची भारतीय कलेला मिळालेली देणगी आहे असं या सर्व शिल्पाकृती पाहिल्यावर लक्षात येतं.

(लेखिका ह्या चित्रकर्त्री, लोककला-अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

राजवंश भारती : गौड राजवंश

सकाळ वृत्तसेवा

Remains of King Shashanka's capital - Karnasuvarnanagari - discovered in excavations near Behrampur.esakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

महाभारतात नकारात्मक भूमिका असलेला ‘ज्येष्ठ पांडव’ म्हणून महारथी कर्ण आपल्याला माहिती आहे. ‘मृत्युंजय’ आणि ‘राधेय’ यांसारख्या अमर साहित्यकृतींचा तो नायक आहे. कर्णाला युवराज दुर्योधनाने ‘अंगदेशा’चे राज्य मैत्रीखातर दिले होते. त्या काळात अंग-वंग-कलिंग हे जोडप्रदेश होते. कर्णाची राजधानी होती ‘चंपानगरी’. तेव्हापासून ‘वंग’ प्रदेश राजकीय पटलावर आहे. महाजनपद काळातही वंग हे एक छोटे जनपद होते. साधारणत: गंगा व ब्रह्मपुत्रेच्या दरम्यानचा प्रदेश वंग प्रदेश म्हटला जातो. (nashik Saptarang latest article on Gauda Dynasty)

महाभारत काळानंतर इ. स. ५५०-५५ च्या सुमारास ‘जयनाग’ या नावाच्या वंग प्रदेशाच्या एका सामंताने, उत्तर गुप्तांच्या परिस्थितीचा फायदा घेत आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. ‘गौड’ हा त्याचा वंश होता. या ‘गौड’ नावाची निश्चित व्युत्पत्ती कळत नाही. पण, ते एक प्राचीन घराणे होते. जयनागानंतर त्याचा मुलगा शशांक सिंहासनावर बसला.

त्याने आपल्या पराक्रमाने गौड वंशाचे नाव सर्वत्र गाजविले आणि बापाने स्थापन केलेले छोटेसे राज्य बरेच विस्तारले. वंग प्रदेशाला एका स्वतंत्र राज्याचा दर्जा त्याने दिला. त्याच्या काळातील दिग्गज अशा उत्तर गुप्त, मौखरी, कामरूप (आसाम) आणि मुख्य म्हणजे पुष्यभूती अशा सगळ्या राजवटींशी तो लढला होता.

आवश्यकता वाटली, तेव्हा त्याने आधी शत्रू असलेल्या उत्तर गुप्तांशी मैत्री करून देवगुप्ताबरोबर युती केली. शशांक राजाचे सगळ्यात मोठे धाडस म्हणजे त्याने देवगुप्तासह मौखरींवरती स्वारी केली आणि राजा ग्रहवर्मनाला ठार करून हर्षाच्या बहिणीला- राज्यश्रीला कान्यकुब्जातच कैद केले. नंतर देवगुप्तावर चालून आलेल्या बलाढ्य राज्यवर्धनाला कपटाने भुलवून तहासाठी निमंत्रण दिले आणि त्याचीही हत्या केली.

यामुळे हर्षवर्धनाने संतप्त होऊन त्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. त्याने शशांकला पूर्णपणे देशोधडीला लावले. कान्यकुब्ज- कन्नोजनगर ताब्यात घेतले. एवढेच नव्हे, तर गौडांची राजधानी ‘कर्णसुवर्ण’ही ताब्यात घेतली. ही नगरी म्हणजेच महाभारतकालीन चंपानगरी होय, असे एक मत आहे आणि शशांक गौड हा महारथी कर्णाचा वंशज होता, असेही एक मत आहे. आज या कर्णसुवर्णनगराचे अवशेष पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबाद जिल्ह्यात बेहरामपूरजवळ आहेत.

रोहतस किल्ल्यात सापडलेली शशांकाची कोरीव राजमुद्रा.

रोहतस किल्ल्यात सापडलेली शशांकाची कोरीव राजमुद्रा.esakal

तिथे पुरातत्त्व खाते १९६२ पासून उत्खनन करते आहे. हर्षाने युद्धात पाडाव केल्यावर राजा शशांक कुठे परागंदा झाला, याचा उल्लेख सापडत नाही. तो नंतर परागंदा होऊन बरीच वर्षे जिवंत होता, असे दिसते. त्याचा मुलगा ‘मानव’ अवघे काही महिने गादीवर नामधारी राजा होता. नंतर सन ६४२ च्या आसपास गौड साम्राज्य कामरूपचा राजा भास्करवर्मनाने बळकावले. पुढे हर्षाचा मृत्यू झाल्यावर सर्वत्र अराजक माजले.

त्या काळात गौड राजांनी आपले राज्य पुन्हा सावरले; पण त्या राजांची नावे आढळत नाहीत. इ. स. ७२५ च्या आसपास कन्नोजच्या यशोवर्मनाने गौड घराणे जवळजवळ संपविले. ‘गौडवाहो ’या ग्रंथात ही युद्ध कहाणी दिलेली आहे, हे आपण याआधीच पाहिले आहे. तरीही, गौड राजवट सन ७५० पर्यंत कशीबशी तग धरून होती. त्यानंतर त्यांची जागा पाल राजवंशाने घेतली.

या संपूर्ण गौड वंशात स्वत: शशांक हा तसा एकच नामांकित राजा झाला; पण त्याने इतिहासात आपला ठळक ठसा उमटवला, यात शंकाच नाही. शशांकाचे तीन ताम्रपट पश्‍चिम बंगालमधील मिदनापूर आणि खडगपूर इथे सापडले आहेत. बिहारमधील रोहतसच्या किल्ल्यात दगडात कोरलेली शशांकाची एक राजमुद्रा सापडली आहे. हर्षाचा समकालीन असा प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यू एन् त्संग (आमच्या शाळकरी भाषेत- युवान श्वांग) याने त्याच्या इतिवृत्तात शशांकाचा उल्लेख ‘शे-सांग-किया’ असा केला आहे.

त्याने कर्णसुवर्ण राजधानीचेही अगदी सविस्तर वर्णन केले. ती अत्यंत श्रीमंत व सुविधापूर्ण नगरी असल्याचे ह्यू एन् त्संग लिहितो. याशिवाय, बाणाच्या ‘हर्षचरितात’ शशांकाचा उल्लेख येतो; पण तो ‘खलनायक’ म्हणूनच येतो. आणि ते अपेक्षितच आहे. बाणभट्ट शेवटी हर्षाच्या पदरी होता‌. तो शशांकाला शत्रू मानूनच लिहील, यात नवल कोणते? पण, हे सर्व नकारात्मक चित्रण विचारात घेऊनही एक गोष्ट निर्विवाद आहे- शशांकाने एकट्याने आपले ‘गौड’ घराणे अजरामर केले.

Remains of King Shashanka's capital - Karnasuvarnanagari - discovered in excavations near Behrampur.

इतके, की वंग राज्य पुढे अपभ्रंश होऊन जेव्हा बंग अथवा नंतर बंगाल या नावे ओळखले गेले, तेव्हापासून अगदी आजही गौड हा शब्द बंगालशी जोडला जातो. या वंग प्रांतातील लोक गूढविद्या, तंत्र-मंत्र या प्रकारांमध्ये फार नावाजले गेले आहेत. त्यामुळे एखाद्या गूढ, रहस्यमय गोष्टीला आपण आजही ‘गौडबंगाल’ म्हणतो! शशांकाने वंगभूमीला आणखी एक देणगी दिली आहे. त्याने वेगळी कालगणना रूढ केली. तिला ‘वंगाब्द’ किंवा ‘बंगाब्द’ म्हणतात. इ. स. ५९४ हे वंगाब्द १ आहे.

या हिशेबाने सन २०२४ म्हणजे वंगाब्द १४३०-३१ येते. हे पंचांग प. बंगालमध्ये आजही प्रचलित आहे. काही इतिहासकारांनी या बंगाब्दाचे श्रेय त्यांच्या लाडक्या अकबर बादशहाला दिलेय; पण बंगाली माणसे याला कडाडून विरोध करतात. ते म्हणतात, आमच्या शशांक राजाने कितीतरी पूर्वी सुरू केलेला बंगाब्द स्वत:च्या खाती जमा करणारा अकबर कोण? थोडक्यात सांगायचे तर, राजा शशांक हा बंगालचा मानबिंदू आहे आणि ‘गौड साम्राज्य’ हा शशांकाचा जणू ‘वन मॅन शो’ होता! 

काश्‍मिरातील मार्तंड सूर्य मंदिर

डॉ. राधिका टिपरे

martand surya mandir in kashmirsakal

या वेळच्या काश्मीर भेटीत एक नक्की ठरवलं होतं. नेहमीची, प्रसिद्ध पर्यटन स्थळं पाहण्यात वेळ घालवायचा नाही. किशनगंगा नदीच्या खोऱ्यातील गुरेझ व्हॅलीकडं जाण्यापूर्वी माझ्याकडं श्रीनगरमध्ये घालवण्यासाठी फक्त एकच दिवस होता. त्या एका दिवसात मला श्रीनगरपासून काही अंतरावर असलेल्या दोन प्राचीन हिंदू मंदिरांना भेट द्यायची होती. ही मंदिरे अतिशय प्राचीन तर आहेतच; पण आज घडीला त्यांची अवस्था जवळपास खंडहर झालेली आहे. तरीही ती पाहण्याची मनस्वी इच्छा होती.

आम्हाला एअरपोर्टवर घेण्यासाठी जहान नावाचा, एक देखणा काश्मिरी तरुण आला होता. अतिशय शांत, अदबीनं बोलणारा जहान पुढील चारपाच दिवस आमच्यासोबत असणार होता. त्याच सकाळी, ही मंदिरं पाहण्यासाठी बाहेर पडलो. श्रीनगरपासून साधारणपणे ऐंशी किलोमीटर अंतरावर, अनंतनाग जिल्ह्यामध्ये हे मार्तंड सूर्य मंदिर आहे. तत्पूर्वी वाटेत असणारं अवंती स्वामी मंदिर पाहून पुढं जायचं असा काहीसा कार्यक्रम ठरला होता.

श्रीनगरपासून केवळ सत्तावीस किलोमीटर अंतरावर असणारं, अवंती स्वामी नावानं ओळखलं जाणारं विष्णू मंदिर पाहण्यासाठी आम्ही शहराच्या बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवरून आमचा प्रवास सुरू झाला. श्रीनगर ते कन्याकुमारी म्हणजेच आसेतू हिमाचल असा धावणारा हा महामार्ग त्या क्षणी अतिशय आपलासा वाटला.

एकतर आपलं असलेलं काश्मीर आता खऱ्या अर्थानं आपलसं वाटत होतंच. त्यात देशाच्या दुसऱ्या टोकाला थेट घेऊन जाणार्‍या रस्त्यावर आपण आहोत ही भावना उगाचच मनाला कावरंबावरं करीत होती. वाटेत पँपोरनंतर रस्त्याच्या कडेला असणारी केशराची शेतं नजरेला पडली. लेठीपोरा गावातील काही शेतामध्ये अद्यापही एखाद दुसरं जांभळ्या रंगाचं जमिनीलगत फुललेलं फूल दिसत होतं. केशराची जांभळ्या रंगाची ती चिमुकली फुलं पाहून न राहवून कार थांबवून मी खाली उतरले.

केशराचा सिझन संपत आलेला होता. एखाददुसरं फुल इथं तिथं फुलल्याचे दिसत होतं. केशराचं पीक फक्त तीन महिन्यांत येते. जुलैच्या पहिल्या पावसानंतर पेरणी होते आणि ऑक्टोबरपर्यंत फुलं तयार होऊन केशर गोळा केलं जातं. फुलांपासूनही सरबत वगैरे तयार केलं जातं असं जहाननं सांगितलं. अख्ख्या काश्मीरमध्ये फक्त पँपोरच्या आसपासच्या काही भागातच केशर पिकवलं जातं, इतरत्र नाही. निसर्गाचे पण काय नियम असतील कुणास ठाऊक...!

अवंती स्वामी मंदिराचं भव्य आवार पाहून मी चकित होऊन गेले. चारही बाजूंनी भव्य दगडी बंदिस्त आवार असलेलं हे मंदिर पूर्णतया भग्न अवस्थेत होतं. ते अवशेष पाहून काश्मीरमधील मंदिर स्थापत्यशैलीचा आणि दगडातील बांधकामाचा अंदाज आपल्याला येत होता. परंतु, एका अत्यंत सुंदर मंदिराचे पडझड झालेले भग्नावशेष पाहून मनाला क्लेष तर झालेच पण कोरीव कामाचा उत्कट कलाविष्कार अशा तऱ्हेनं मातीत विखुरलेल्या अवस्थेत पडलेला पाहून अतिशय दु:खही झालं.

हे भव्य मंदिर राजा अवंतीवर्मन यानं नवव्या शतकात (८५३-८५५ इ.स.) बांधलं होतं. ‘उत्पाला’ राजवंशाची स्थापना या राजानंच केली होती. ‘विश्वसर’ या नावाच्या शहराजवळ त्यानं ‘अवंतीपूर’ नावाचं राजधानीचं शहर वसवले. त्याच्या राज्यकाळात उत्पाला राज्याची अतिशय भरभराट झाली होती असं मानलं जातं.

आपल्या कारकीर्दीत त्याने अनेक हिंदू मंदिरांची निर्मिती केली होती. त्या काळात काश्मीर प्रामुख्यानं हिंदू धर्मीयांचं, तसेच शैव पंथीयांचं महत्त्वाचं केंद्र होतं. लोकांमध्ये हिंदू धर्माबद्दल आस्था होती. संस्कृत भाषेचं माहेरघर असणाऱ्या काश्मीरमध्ये अनेक विद्वान पंडित होते, ज्यांच्याद्वारे विविध संस्कृत वाङ्मयाची निर्मिती होत होती.

हिंदू धर्माचं तसंच हिंदू धर्मग्रंथांचं महत्त्व लोकांना माहीत होते. अवंती स्वामीचं हे मंदिर विष्णूदेवासाठी निर्माण केलं होतं. परंतु आता पूर्णपणे खंडहर झालेल्या या मंदिरात कुठल्याही देवतेची मूर्ती आता अस्तित्वात नाही. काही शिल्पपट पाहायला मिळतात, परंतु त्यांची अतिशय झीज झालेली आहे. त्यामुळं बहुतेक शिल्पपटांची, तसेच शिल्पमूर्तींची ओळख करणंही अतिशय अवघड आहे.

आम्ही तेथे असलेल्या एकुलत्या एका गाइडला माहिती सांगण्यासाठी ठरवलं. पण त्या तरुणाला फारशी माहिती नाही हे माझ्या लगेचच लक्षात आले. कारण मी स्वत: गेली अनेक वर्षं पर्यटन खात्याची गाइड म्हणून काम करते आहे... ना त्याला हिंदू धर्माची व्यवस्थित माहिती होती ना हिंदू देवीदेवतांची... पण मंदिराबद्दलची अतिशय जुजबी आणि इकडची तिकडची माहिती सांगून त्यानं माझ्याकडून ठरलेली फी वसूल केली. असो,

एका आयताकार, स्तंभाधारित तटबंदीनं बंदिस्त अशा विशाल प्रांगणामध्ये संपूर्ण मंदिराचे भग्नावशेष इथं-तिथं विखुरल्याचे पाहायला मिळते. काळा बॅसॉल्ट पाषाणाच्या अतिशय मोठमोठ्या शिळांच्या साहाय्याने बांधलेले स्तंभ गतकाळातील वैभवाच्या खाणाखुणा दर्शवत मूकपणे उभे आहेत. मंदिराच्या तटबंदीला पश्चिमेकडं भव्य प्रवेशद्वार आहे. प्रचंड आकाराचे स्तंभ उंंच जोत्यावर उभे आहेत.

आपल्याला पायर्‍या चढूनच वर जावं लागते. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस भिंतींवर बरेच कोरीव काम केल्याचे दिसून येते. काही शिल्पपटातून अजूनही बारीक कलाकुसर आणि आणि यक्षप्रतिमांचं अंकन ओळखता येतं. भिंतीवर काही ठिकाणी देवकोष्ठ असून त्यातील देवतांच्या मूर्ती मात्र ओळखण्याच्या पलीकडे छिन्न झालेल्या आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वाराची भव्यता पाहिल्यानंतर आपल्याला त्या काळातील काश्मिरी मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा अंदाज येतो.

अवंती स्वामी मंदिर पंचायतन असून मुख्य मंदिराचे अवशेष प्रांगणाच्या मध्यभागी पाहायला मिळतात. प्रांगणाच्या चारही कोपर्‍यात लहान आकाराच्या मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. या मंदिरामध्ये कोणत्या देवता होत्या याचा अंदाज करता येत नाही... कारण फक्त पाया आणि काही भिंती एवढेच अवशेष शिल्लक उरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या समोरील भग्न स्तंभाच्या तळाकडील भागावर काही शिल्पपट पाहायला मिळतात.

त्या ठिकाणी बहुदा कामदेव, राजा अवंतीवर्मन, राणी अशा काही प्रतिमांचे अंकन केल्याचे पाहायला मिळाले. पंधराव्या शतकात आलेल्या मुस्लिम शासकांनी काश्मीरमधील बहुतांशी हिंदू मंदिरांचा विनाश केला. त्यामुळेच या सुंदर मंदिरांचे भग्नावशेष पाहण्याची वेळ आपल्यावर आली आहे, हे सत्य नाकारता येत नाही.

राजा अवंतीवर्मन हा कश्यप समाजातील असल्यामुळेच काश्मीरला काश्मीर हे नाव मिळाले असं मानले जाते. अवंतीपोरा मधील अवंती स्वामी मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही मार्तंड सूर्य मंदिर पाहण्यासाठी निघालो. हे मंदिर अनंतनाग जिल्ह्यामध्ये आहे. काही वेळातच राष्ट्रीय महामार्ग सोडून अनंतनागकडे जाणारा रस्ता घेतला.

काश्मीर खोर्‍यातील हे मार्तंड सूर्य मंदिर, अनंतनागपासून नऊ किलोमीटर अंतरावर, मट्टन गावातील एक उंच टेकडीवरील प्रशस्त पठारावर बांधण्यात आले होते... या जागेपासून संपूर्ण काश्मीर खोर्‍याचं विहंगम दृश्य नजरेला पडतं...! आज जरी हे सूर्य मंदिर पूर्णपणे खंडहर अवस्थेत आहे तरी त्याचे भग्नावशेष पाहिल्यानंतर या मंदिराच्या भव्यतेची सहज कल्पना करता येते. विशेष म्हणजे मंदिराचा आराखडा आणि स्थापत्यशैली अवंती स्वामी मंदिरासारखीच आहे. त्यावरून आपल्याला काश्मीर येथील मंदिरांच्या वास्तुशैलीची कल्पना करता येते.

मुख्य मंदिराच्या सभोवती दगडात बांधलेली भक्कम तटबंदी आहे. उंच स्तंभांवर आधारित या तटबंदीमध्ये जवळजवळ चौर्‍याऐंशी देवकोष्ठ आहेत. आता या कोष्ठांमध्ये कुठल्याही देवतेची मूर्ती नसली, तरी कधी काळी या सर्व लहान मंदिरांमध्ये विविध देवदेवतांची पूजा होत असावी असं वाटतं. विस्तीर्ण प्रांगणाच्या मध्यभागी मुख्य सूर्य मंदिर असून त्याची लांबी दोनशे वीस फूट तर रुंदी एकशे बेचाळीस फूट आहे. मार्तंड सूर्य मंदिर इसवी सनाच्या आठव्या शतकात, कर्कोटा राज्यकर्त्यांच्या शासनकाळात, तृतीय राजा ललितादित्य मुक्तपिदा यांनी बांधलं होतं, अशी मान्यता आहे.

काहींच्या मते मंदिराचं निर्माणकार्य चौथ्या किंवा पाचव्या शतकात राजे रणादित्य यांच्या काळात सुरू झाले होते. मात्र पंधराव्या शतकात काश्मीर खोर्‍यात राज्य करणारा मुस्लिम शासक सुलतान सिकंदर शाह मीर यानं या मंदिराची तोडफोड केली. मार्तंड मंदिराची सध्याची दयनीय अवस्था होण्यासाठी काश्मीर खोर्‍यात झालेले भूकंपही कारणीभूत आहेत, असेेही म्हटले जाते.

पण मंदिरांचा विध्वंस करण्याचे श्रेय तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांकडं जातं ही गोष्ट मात्र नाकारता येत नाही. काळाच्या ओघात मार्तंड मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. पण पुरातत्त्व खात्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे पुनर्निर्माणाचे कार्य करून सद्यःस्थितीतील मंदिर उभे केलेले आहे.

मंदिराच्या प्रांगणाचं मुख्य प्रवेशद्वार तटबंदीच्या पश्चिम भिंतीमध्ये असून त्याचा आकार भव्य आहे. विशेष म्हणजे मुख्य सूर्य मंदिराचे प्रवेशद्वार आणि तटबंदीतील प्रवेशद्वार दोन्ही पश्चिम दिशेस, एकाच सरळ रेषेत असून, आकारही एकसारखा आहे. प्रचंड आकाराचे स्तंभ आणि उंच कमान यामुळे पडझड झालेली असूनही मंदिराची भव्यता डोळ्यात भरते. मंदिर बांधण्यासाठी वापरलेले दगड किंवा चिरे आकाराने मोठे आहेत.

एकूणच, काश्मिरी शैलीमध्ये बांधलेल्या या मंदिराची भव्यता उठून दिसते. शिवाय काश्मिरी मंदिर वास्तुशैलीवर गांधार, गुप्ता तसेच चिनी स्थापत्य शैलीचा प्रभाव असल्याचे ठळकपणे जाणवते. मंदिरातील कमानींची रचना वेगळ्या पद्धतीची असल्याचे जाणवते. काही ठिकाणी कोरीव कामाचे जीर्णशिर्ण झालेले शिल्पपट पाहायला मिळतात; पण त्यांची ओळख पटणे अशक्य आहे.

तटबंदीमध्ये असलेल्या लहान आकाराच्या मंदिरांमध्ये कुठली देवता होती यांचा अंदाजही करता येत नाही. सूर्य मंदिराच्या आजूबाजूला काही लहान मंदिरांची जोती (पाया) किंवा स्तंभाचे भग्नावशेष विखुरलेल्या अवस्थेत पडल्याचे दिसून येते. स्तंभ शीर्ष असणारे आमलक पद्धतीचे गोल कोरीव दगड, काही ठिकाणी स्तंभांच्या पायाकडे असणारे चौकोनी आकाराचे कोरीव दगड इतस्तत: पडलेले पाहून मनस्वी दु:ख होते.

प्रत्यक्ष मंदिराच्या भिंतीवरही बर्‍यापैकी कोरीव काम केलं असावं. परंतु आता मात्र ते अजिबात ओळखू येत नाही. मुख्य म्हणजे तीन ते चार महिने मंदिरावर बर्फाची चादर आच्छादलेली असल्याकारणानं कोरीव काम झिजून गेलं आहे. काही ठिकाणी लहान लहान देवकोष्ठांमधून मूर्ती कोरल्याचे लक्षात येतं. त्यापैकी एक विष्णू आणि दुसरी शिवप्रतिमा असावी असे वाटते. काही देवकोष्ठांमध्ये स्त्री प्रतिमा आहेत; परंतु त्यांची ओळख ठरवता येत नाही.

शिल्पाकृतींच्या कोरीव कामात रेखीवपणाचा अभाव तीव्रतेने जाणवतो. देवकोष्ठांची रचना द्रविड शैलीपेक्षा खूप वेगळी आहे. मंदिराची भव्यता पाहिल्यानंतर; हे मंदिर त्याच्या पूर्ण रूपात उभं असताना कसे दिसत असेल याची मनोमन कल्पना करताना मन बैचेन होऊन गेले. मंदिराच्या सभोवती अतिशय सुंदर बगिचा आहे.

त्यात फुललेल्या गुलाब फुलांना पाहूनही मन अगदी सैरभैर होऊन गेलं होतं. काश्मीर भेटीदरम्यान तेथील निसर्ग सौंदर्य पाहण्याचा आनंद अवर्णनीय असतोच. पण ही दोन्ही मंदिरं पाहिल्यानंतर खंडहर असूनही सुंदर आणि भव्य काहीतरी पाहिल्याचं समाधान मिळतं हे नक्कीच.

(लेखिका ह्या देश-विदेशात भ्रमंती करत असतात, विशेष स्वरूपाच्या पर्यटनस्थळांची माहिती देणारी काही पुस्तकं तसंच अजिंठा इथल्या लेणींवरील त्यांचं संशोधनात्मक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे.)

राजवंश भारती : मौखरी राजवंश

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

गुप्त वंशाच्या पतनानंतर भारतातील राजकीय परिस्थिती अशी झाली होती की, गुप्तांच्या अंकित राजांनी आणि सामंतांनी जागोजागी आपला अधिकार सांगायला सुरुवात केली होती. त्यामुळे गुप्तोत्तर काळातील राजवंश एकानंतर एक अशा क्रमाने सत्तेवर येण्यापेक्षा ठिकठिकाणी एकाच वेळी - समांतर असे सत्तेवर आले. याच प्रकारे उत्तर गुप्तांच्या जोडीने, साधारण त्याच काळात "मौखरी" वंश राजकीय पटलावर आला. (Nashik saptarang latest article on Moukhari Dynasty)

मौखरींची माहिती आपल्याला मिळते ती प्रामुख्याने असीरगडचा ताम्रलेख, 'हरहा' चा शिलालेख, बराबर (बिहार) येथील नागार्जुनी गुहेतील तीन कोरीव लेख, अनेक नाणी यांच्या माध्यमातून. शिवाय बाणभट्टाच्या 'हर्षचरित्रात’ पण मौखरींचा उल्लेख आहे. रामायणातील केकय आणि महाभारतातील मद्र देश (अश्वपती राज्य) या नावे जो प्रांत ओळखला जातो, तो भारताचा वायव्य प्रांत हे मौखरींचे मूळ ठिकाण असावे.

ते प्राचीन काळापासून भारतात होते, पण तो 'राजवंश' म्हणून ६ व्या शतकात उदयाला आला. या वंशाला कान्यकुब्ज वंश म्हणूनही ओळखले जाते. तीच त्यांची राजधानी होती. तेच नगर पुढे 'कन्नोज' या नावे प्रसिद्ध झाले. इतिहासात मौखरींच्या तीन शाखा आहेत - कान्यकुब्ज (कन्नोज) शाखा, करेन्ती शाखा आणि बराबर शाखा.

यातली कन्नोज शाखा ही खरी प्रसिद्ध अन् शक्तिशाली होती. या वंशातील राजांना 'वर्मन' अथवा 'वर्मा' हे अभिधान आहे. 'हरिवर्मन' या गुप्तांच्या सामंताने मौखरी राज्य इ.स. ५१० च्या सुमारास स्थापन केले. आदित्यवर्मन आणि ईश्वरवर्मन हे पुढील दोन राजे. इथपर्यंत मौखरी राज्य तसे नगण्य होते.

पण चौथा शासक ईशानवर्मन अत्यंत महत्त्वाकांक्षी होता. त्याने गौडवंशीय राजांशी युद्ध करून मौखरी राज्य विस्तारले. त्याने हूणांनाही पराजित केले असे दिसते. तसा उल्लेख हरहा च्या शिलालेखात आहे. तथापि, उत्तर गुप्त वंशाचा कुमारगुप्त याने एका लढाईत ईशानवर्मनाचा पराभव केला, पण तो सतत मौखरींच्या दबावाखाली राहिला.

नंतर ईशानवर्मनाचा मुलगा शर्ववर्मनाने या पराभवाचाही वचपा काढला आणि गुप्तांना धूळ चारली. ईशानवर्मन आणि शर्ववर्मन यांच्या काळात, म्हणजे इ‌.स. ५५४ ते ५८६ या दरम्यान मौखरींचा सर्वत्र दबदबा होता. नंतर अवंतिवर्मनाने पुष्यभूती राजघराण्याशी (सम्राट हर्षवर्धनाचे घराणे) मैत्रीचे संबंध जोडले. (latest marathi news)

हर्षचरित्रात त्याच्याविषयी गौरवोद्गार काढताना बाणाने म्हटले आहे की 'त्याच्या काळात मौखरवंश हा सर्व राजांमध्ये शीर्षस्थानी होता..' (धरणीधराणां मूर्ध्निस्थितो) या वेळी उत्तर गुप्त महासेनाने तर अवंतिवर्मनाचे मांडलिकत्व स्वीकारले होते. त्याच्या नंतरचा राजा ग्रहवर्मन हा या शाखेतील अखेरचा ठरला. याच्याविषयी ठळक घटना अशी की, त्याचा विवाह हर्षवर्धनाची सख्खी बहीण 'राज्यश्री' हिच्याशी झाला होता.

मगधाचा राजा देवगुप्त याने ग्रहवर्मनाची हत्या करून राज्यश्रीला बंदिवासात टाकले होते. हर्षाचा मोठा भाऊ राज्यवर्धनाने तिची सुटका केली. नंतर राज्यश्रीने स्वत:च राज्यकारभार हाती घेतला, पण मौखरी म्हणून नव्हे, तर माहेरच्या पुष्यभूती वर्धनांच्या मदतीने. तिने मौखरी राज्य वर्धन राज्यात विलीनच केले.

अशा प्रकारे मौखरी वंश इ.स. ६०५ च्या आसपास संपुष्टात आला. ग्रहवर्मनाला एक भाऊ असावा, ज्याच्या नावाचा उल्लेख नालंदा येथील एका मुद्रालेखात आहे, पण ते अक्षर 'सुव' अथवा 'सुच' असे अर्धवट तुटके आहे. त्यामुळे त्याचे नाव काय हे आज सांगता येत नाही. तो बहुदा ग्रहवर्मनाच्या आधीच वारला असावा.

एकीकडे करेन्ती आणि बराबर येथील शाखांचे राजे मात्र नंतरही बराच काळ सत्तेवर होते; करेन्ती शाखेचे राजे तर ११ व्या शतकापर्यंत होते. पण त्यांचे अधिकारक्षेत्र अगदी मर्यादित व दुय्यम दर्जाचे होते. त्यामुळे 'राजवंश' म्हणून ते फारसे दखलपात्र नाहीत. (latest marathi news)

यशोवर्मन : वरील वर्मनांच्या यादीमधे शोभेल, असा आणखी एक वर्मन इतिहासात होऊन गेला... त्याने हर्षाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढली - थेट इ.स. ७००/२५ च्या आसपास! त्या काळी कन्नौजला 'यशोवर्मन' हा एक पराक्रमी राजा होऊन गेला. एखाद्या धूमकेतू प्रमाणे हा यशोवर्मन काही काळ चमकून गेला.

'वाक्पतीराज' या पंडिताच्या "गौडवाहो" या प्राकृत ग्रंथात या यशोवर्मनाची माहिती मिळते. हा वाक्पती यशोवर्मनाच्या पदरी भाट होता. त्याने आपल्या धन्याची प्रशस्ती करणारे हे महाकाव्य लिहिले आहे. गौडवाहो याचा शब्दश: अर्थ आहे, 'गौड राजाचा वध'. यशोवर्मनाने वंग देशाच्या शक्तिशाली गौड राजावर कशी स्वारी केली आणि किती जणांवर विजय मिळवला याची अतिरंजित कहाणी गौडवाहो मधे आहे.

पण या काव्यात यशोवर्मनाचा राज्यकाळ, त्याच्या शत्रूंची नावे इत्यादि तपशील कुठेच नाही. हा कोण, कुठला ; याचा काही निश्चित अंदाज बांधता येत नाही. पण तो काश्मीरच्या ललितादित्य मुक्तापीडाचा समकालीन होता. काळ बराच नंतरचा असला, तरी ॲलेक्झॅंडर कनिंगहॅम चे मत आहे की तो मौखरी वंशातीलच असावा.

हेच मत डॉ. श्री.द. कुळकर्णींचे आहे. इथे एका संभाव्य गोंधळाचा उल्लेख केला पाहिजे. स्वा.सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने' मध्ये "हूणान्तक यशोधर्मा" याचा उल्लेख आहे. तो आधी होऊन गेलेला माळव्याचा राजा आणि 'औलीकर' घराण्यातील आहे. तसेच, आणखी एक यशोवर्मन पुढे, इ.स. ९२५ मधे होऊन गेला. तो चंदेल वंशाचा होता.

तिघेही वेगवेगळ्या काळातील होते. 'मौखरी' हे नाव कशावरून किंवा कोणावरून दिले गेले याचा उलगडा मात्र झालेला नाही. पाणिनीच्या अष्टाध्यायी मध्ये 'मोखरिया' नामे एका व्यक्तीचा उल्लेख आहे. कदाचित तो या वंशाचा मूळपुरुष असावा. अर्थात्.. हा केवळ एक अंदाज ! 

शुंग-कण्व काळातले स्तूप (भाग २)

विजय टिपुगडे

प्रारंभीच्या काळात मृताच्या पार्थिव अवशेषावर स्तूपरचना करण्यात येई; परंतु नंतरच्या काळात अनेक स्तूपांची आवश्यकता भासू लागली, म्हणून स्तूप हे गौतम बुद्धांच्या महानिर्वाणाचे प्रतीक मानले गेले व त्यांना उपास्य वास्तू असं स्वरूप आलं. अनेक गुहामंदिरांमधल्या चैत्यांमध्ये कोरलेले स्तूप या प्रकारचे आहेत. ‘एक पूजनीय प्रतीक’ असंच त्यांचं स्वरूप नंतरच्या काळात राहिलेलं दिसतं.

भरहुत स्तूप

शुंग वंशाच्या काळात इसवीसनपूर्व १५० च्या सुमारास एक भव्य स्तूप मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात (पूर्वीचं नागोद) भरहुत या ठिकाणी बांधण्यात आला होता. अनास्थेमुळं काही शतकांनंतर तो पडून गेला व नामशेष झाला.

सन १८७३ मध्ये तिथं केलेल्या उत्खननात त्याच स्तूपाच्या वेदिका व पूर्वतोरणाचे काही अवशेष सापडले. ते ‘कलकत्ता म्युझियम’मध्ये ठेवण्यात आले आहेत. काही अवशेष युरोप-अमेरिकेतल्या कलासंग्रहालयात आहेत. मूळ जागी आज स्तूपाचं काहीच अस्तित्व आढळत नाही. अस्तित्वात असणाऱ्या अवशेषांवरूनच ही वास्तुकला अभ्यासावी लागते.

तोरणावरची सजावट, तसंच वेदिकेच्या तीन उभ्या खांबांवर असलेल्या आडव्या, अवजड शिलेवर एका बाजूला कमलपुष्पांची सुंदर मालिका कोरलेली पाहायला मिळते. वेदिकेच्या उभ्या खांबांवर वर्तुळाकार कोरलेल्या कमलपुष्पांच्या मध्यावर पागोटं घातलेल्या माणसांची डोकी कोरलेली आहेत.

ती प्रतीकात्मकरीत्या विविध राज्यांची असावीत असा एक तर्क केला जातो. इतर वर्तुळाकार सजावटीत वीसपेक्षा जास्त जातककथा व बुद्धजीवनावरील पाच-सहा प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत. एकाच शिल्पात विविध प्रसंग कोरलेले आढळतात.

एकामागून एक असे क्रमानं घडलेले अनेक प्रसंग एकाच शिल्पात दाखवण्याची पद्धत तेव्हा होती, असं त्यातून दिसतं. मृगजातक, महाकपिजातक, मायादेवीचं स्वप्न, जेतवनविहाराचं दान इत्यादी वर्तुळाकारातली प्रसंगशिल्पं विशेष उल्लेखनीय आहेत.

शालभंजिका

प्रवेशद्वारावरच्या कोपऱ्यात स्तंभावर वेदिकेतल्या उभ्या खांबावर कोरलेल्या मनुष्याकृती या स्तूपाचं रक्षण करतात असा एक समज तत्कालीन समाजात होता. या संरक्षक मूर्ती त्यांच्या नावांसह कोरलेल्या आहेत. अशा मूर्तींमध्ये भरहुत स्तूपाच्या एका वेदिकास्तंभावरची यक्षिणी ही चुलालोकदेवतेची मूर्ती शालभंजिका म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. शालवृक्षाला बिलगून असलेल्या स्त्रीच्या आकृतीला ‘शालभंजिका’ किंवा ‘वृक्षिका’ असं म्हणतात.

भरहुतची ही यक्षिणी अखंड स्तंभावर उथळ उठावात कोरलेली आहे. ती हत्तीवर उभी असून उजव्या हातानं तिनं वृक्षाची फांदी धरलेली आहे. हत्तीच्या पाठीवर उजवा पाय ठेवून दुसऱ्या पायानं वृक्षाच्या खोडाला तिनं विळखा घातलेला आहे. ही मूर्ती खूप सुबक आहे. अशाच प्रकारचं काम सांचीच्या तोरणावर व अन्यत्रही आढळतं.

मृगजातककथा

कथेतले प्रसंग गंगातीरावरच्या जंगलात घडून आले आहेत. गौतम बुद्ध त्यांच्या एका पूर्वजन्मात सुवर्णमृगाच्या रूपात जन्माला आले होते असा हा प्रसंग आहे.

हा सुवर्णमृग पाणी पिण्यासाठी गंगातीरी आला असता त्याला एका सावकाराचा मुलगा नदीच्या पाण्यात बुडताना दिसला. तेव्हा त्या सुवर्णमृगानं त्या मुलाला आपल्या पाठीवरून तीरावर सुखरूप आणलं असा हा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. या शिल्पात नदीच्या लाटा, तसंच तरुणाला पाठीवर घेऊन काठापर्यंत आलेला सुवर्णमृग दाखवण्यात आला आहे. 

उजव्या कोपऱ्यातल्या शिल्पात याच कथेतला दुसरा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. बनारसची राणी स्वप्नात तो सुवर्णमृग पाहते...तो मृग मिळवण्यासाठी राजा बक्षीस जाहीर करतो...बक्षिसाच्या आमिषानं सावकाराचा तो मुलगा राजाला सुवर्णमृगाच्या ठिकाणी घेऊन जातो...राजा धनुष्याला बाण लावून सुवर्णमृगाचा वेध घेत असतानाच तो मनुष्यरूप धारण करतो व राजाला उपदेश देतो. तो उपदेश राजा हात जोडून नम्रपणे ऐकतो.

सांचीचा महास्तूप

सांचीचा मूळ स्तूप सम्राट अशोकांच्या वेळी इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात विटांनी बांधला होता. त्यामुळेच स्तूपाच्या अस्तित्वाला कोणताही धक्का न लावता त्याचा आकार दुप्पट वाढावला गेला. स्तूपाच्या दुरुस्तीचं काम इसवीसनपूर्व १५० च्या सुमारास सुरू झालं. ते अनेक वर्षं चाललं. त्याचा विस्तार शुंगकाळात व आंध्रकाळात झाला.

आज स्तूपाचा एकूण विस्तार ३६ मीटर असून त्याची उंची १६५ मीटर आहे. इथल्या दुसऱ्या प्रदक्षिणापथावर येण्यासाठी दक्षिणेच्या बाजूनं दोन जिने आहेत, तसंच अंडाकार आकाराच्या घुमटाकार हार्मिका असून तीन छत्र्याही आहेत.

सांचीची उठावशिल्पं ही भरहुत व बुद्धगया इथल्या शिल्पांपेक्षा अधिक खोलगट आहेत. जातककथा व बुद्धजीवनातल्या प्रसंगांखेरीज  लोकजीवनाचंही चित्रण इथल्या शिल्पांमधून आढळतं.

धार्मिक उत्सव, प्रासाद, लहान घरं, झोपड्या, तटबंदी असलेली शहरं, उद्यानं, ग्रामीण जीवन, तिथले व्यवसाय असे लोकजीवनाचे अनेक पैलू या शिल्पांमध्ये आढळतात. इथली शिल्पं अधिक प्रगत आणि सजीव व सौंदर्यपूर्ण वाटतात. एकूणच या शिल्पसौंदयार्मुळे सांचीचा स्तूप आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

(लेखक हे चित्रकार, स्तंभलेखक, कलाभ्यासक आहेत.)

गजमालिकेची ‘पितळखोरा लेणी’

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यात फार महत्त्वाच्या आणि प्रचंड वैविध्य असलेल्या ऐतिहासिक वास्तू आहेत. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते अगदी सतराव्या शतकापर्यंत तयार करण्यात आलेल्या ऐतिहासिक वास्तूंमुळे या जिल्ह्याचा जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास सहजपणानं समजण्यास मदत होते. यामध्ये लेणी आहेत, किल्ले आहेत, महाल आहेत, मकबरा आहे.

नगरविकास करण्यास कारणीभूत ठरणारी बांधकामे आहेत. अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या समाधीस्थळं आहेत. मंदिरं आहेत. यापैकीच एक म्हणजे दोन हजार वर्षांचा इतिहास सांगणारी आणि घनदाट जंगलात अस्तित्व टिकवून असलेली पितळखोरा लेणीसमूह. महाराष्ट्रात किंबहुना पश्चिम भारतात निर्माण करण्यात आलेल्या सर्वांत पुरातन लेणीसमूहांपैकी एक.

गौताळा अभयारण्यात अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणी पितळखोऱ्याची लेणी आहेत. एकूण १४ लेणींचा समूह असलेल्या या लेणींमध्ये चार चैत्यगृह आहेत, काही विहार आहेत आणि स्मृतिस्तूप विथिका आहे. ‘पितग्याल’ या नावानं पुरातन काळात प्रसिद्ध असलेल्या या लेणींमध्ये हीनयान तसेच महायान संप्रदायाचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो.

ढोबळमानानं सांगायचं झाल्यास, हीनयान किंवा थेरवाद संप्रदायात कोणत्याही स्वरूपात बुद्धप्रतिमांची निर्मिती किंवा पूजाअर्चा करण्यात येत नव्हती. तर, महायान काळात गौतम बुद्धांना विविध स्वरूपानं चित्रकला तसेच मूर्तिकलेमध्ये दर्शवण्यात आलं होतं.

पितळखोरा येथे गौतम बुद्धांची एकही दगडात निर्माण केलेली प्रतिमा नसली, तरीही लेणी क्रमांक तीनमधील खांबांवर स्थानक तसेच बसलेल्या अवस्थेतील गौतम बुद्धांची तीसपेक्षा जास्त चित्रे चितारली आहेत. यावरून, या लेणीची निर्मिती ही इसपू दुसऱ्या ते इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकापर्यंत झाल्याचा अंदाज आपण लावू शकतो.

लेणींचा काळ ठरवताना त्यांचं स्थापत्य, त्यावर कोरण्यात आलेले शिलालेख ज्याप्रकारे लक्षात घेतले जातात, अगदी त्याच प्रकारे बुद्धप्रतिमांचं अस्तित्वही ध्यानात घेतलं जातं. टॉलेमीच्या लिखाणात या लेणींचा उल्लेख ‘पेट्रीगल’ या नावानं आलाय.

लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ गाड्या लावून, काही पायऱ्या उतरून आपण मुख्य लेणी परिसरात प्रवेश करतो. इथं सुरुवातीलाच एक धबधबा आहे आणि त्याच्या खाली, काही अंतरावर पाणी अडवण्यासाठी केलेली व्यवस्था आढळते. लेणीमध्ये राहणाऱ्या बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी, वाटसरू यांना पाण्याची उपलब्धता व्हावी, म्हणून ही बंधाऱ्याची व्यवस्था केलेली आहे.

लेणीच्या बरोबर मधून एक नदी वाहते, ज्यामुळे एका बाजूला चार तर दुसऱ्या बाजूला दहा अशाप्रकारे लेणींची नैसर्गिकरीत्या विभागणी झालेली आहे. या लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारी शिल्पं. त्यातही, यक्षप्रतिमा. चौथ्या ते पाचव्या शतकाच्या आसपास संपादित करण्यात आलेल्या ‘महामयूरी’ नामक ग्रंथामध्ये या भागात संकरिन नामक यक्षाचे स्थान असल्याचा उल्लेख आला आहे.

काही पायऱ्या चढून आपण चैत्य क्रमांक तीनमध्ये प्रवेश करतो, जिथं बऱ्याच गौतम बुद्धांच्या प्रतिमा आपल्याला खांबांवर रंगवलेल्या दिसतात. अनेक अभ्यासक तसेच पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या मते, हे चित्रकलेचं काम लेणीच्या संवर्धनासाठी करण्यात आलं असावं.

या चैत्यलेणीच्या बाजूला असलेला विहार हा भारतात आढळणाऱ्या सर्व विहारांमध्ये फार वेगळा आहे. या विहाराला गजमालिकेची रचना केलेली दिसून येते. हत्तींची आज बऱ्यापैकी नासधूस झालेली असली, तरीही त्यांच्या उर्वरित आकारावरून ते किती भव्य आणि सुबक असतील, याचा आपल्याला अंदाज येतो. जवळपास पन्नासेक वर्षांपूर्वी म. न. देशपांडे यांनी या लेणी परिसरात उत्खनन केले होते. तेव्हा या लेणीसमोर साचलेला मातीचा ढिगारा बाजूला करत असताना ही संपूर्ण गजमालिका आढळून आली.

गजमालिकेच्या बाजूलाच एक प्रवेशद्वार आहे आणि काही पायऱ्यांची रचना केलेली आहे. या प्रवेशद्वाराला दोन्ही बाजूनं दोन यक्ष आणि दरवाजाच्या वरील बाजूस महामायेचं शिल्प कोरलं होतं. यातील महामाया शिल्प आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात जतन करण्यात आलं आहे. एका बाजूचा द्वारपाल हा आजमितीस नष्ट झालेल्या अवस्थेत आहे तर एक द्वारपाल आजही पितळखोरा इथं मूळ जागेवर आहे.

अशाप्रकारे दरवाजाची रचना असलेला, गजमालिका असलेला, दोन यक्ष पहारेकरी असलेला प्रकार इतरत्र कुठेही आढळून येत नाही. आतील बाजूस अनेक खोल्यांची रचना केलेली आहे. प्रत्येक खोलीच्या प्रवेशद्वारावर चैत्यकमानीची रचना दिसून येते. तर खांबावर अनेक प्राणी कोरलेले आहेत. यातील काही सिंह आहेत, नीलगाय आहेत, बैल आहे, घोडे आहेत. विशेष म्हणजे, यातील काही प्राण्यांना पंख दाखवण्यात आले आहेत.

या लेणीसमूहात अनेक शिलालेख कोरण्यात आले आहेत. त्यातील काही शिलालेखांमधून प्रतिष्ठान आणि धान्यकटक यांसारख्या प्राचीन शहरांचा आणि तेथील व्यापाऱ्यांचा उल्लेख वाचावयास मिळतो. हा लेणीसमूह उज्जैनला जोडण्यात येणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर निर्माण करण्यात आला होता. त्यामुळं अनेक भागातील व्यापाऱ्यांचं इथं येणं-जाणं सुरूच असे.

यासोबतच, इथे सापडलेल्या एका यक्षाची प्रतिमा आज दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. या यक्षाच्या हातावर ‘कन्हदस’ नामक सोन्याच्या व्यापाऱ्याचं नाव कोरलं आहे. हे शिलालेख लेणींच्या आर्थिक घडामोडी तसेच तत्कालीन महत्त्वाच्या गावांची माहिती पुरवतात.

पितळखोरा अतिशय सुंदर आहे. दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक परिस्थिती आणि व्यापाराविषयक अतिशय महत्त्वाची माहिती या लेणींच्या माध्यमातून प्राप्त होते. वेरूळ पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेणीसमूहाविषयी मात्र पर्यटकांना फारशी माहिती नसते. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरात अशाप्रकारचे दुसरं कुठलंही उदाहरण आपल्याला आढळत नाही, इतका हा लेणीसमूह महत्त्वाचा आहे.

राजवंश भारती : उत्तर गुप्तवंश

सकाळ वृत्तसेवा

Vishnu Temple built by King Adityasena. & Inscription of Afsad.. It contains the information of Uttara Gupta.esakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

आदित्यसेन हा उत्तर गुप्तवंशातील सगळ्यात यशस्वी राजा होता, त्याचा उल्लेख ‘महाराजाधिराज’ असा आहे. त्याच्या कारकीर्दीत हा गुप्तवंश शिखरावर होता. आश्चर्य या गोष्टीचे आहे, की २५० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असलेल्या या वंशाविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. कदाचित पूर्वीच्या बलाढ्य गुप्त साम्राज्याच्या तुलनेत या ‘उत्तर गुप्त’ची इतिहासात फारशी दखल घेतली गेली नाही. (saptarang latest article on Northern Gupta dynasty)

स्कंदगुप्तच्या निधनानंतर बलाढ्य गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली. पुढचे राजे नामधारी ठरले. गुप्त राजवटीतील शेवटचा शिलालेख आढळला, तो बंगालमध्ये सन ५४३ मध्ये. त्यानंतरचा एकही शिलालेख गुप्तवंशाचा नाही. त्यांच्या कारकीर्दीतच ठिकठिकाणी मांडलिक राजा आणि सामंतांनी गुप्तांना झुगारून स्वत:ला स्वतंत्र राजे घोषित करायला सुरवात केली होती.

अशाच दुय्यम राजसत्तांपैकी एक ‘उत्तर गुप्त’ या नावाने ओळखली जाते. यांचे मूळ ठिकाण निश्चित सांगता येत नाही; पण ते बहुधा माळवा प्रांतातील असावे. त्यांना ‘गुप्त’ म्हटले गेले ते एवढ्यासाठी की, त्यांच्यापैकी जवळजवळ सर्व राजांच्या नावापुढे ‘गुप्त’ अभिधान लावलेले आहे.

पण, हा वंश तसा आधीच्या गुप्तवंशाशी संबंधित असल्याचा कोणताही पुरावा नाही. उलट तो तसा नसावा, असेच दिसते. कारण त्यांच्या एकाही शिलालेखात त्या श्रेष्ठ गुप्तवंशाचा साधा उल्लेखही नाही. जर तसा संबंध असता तर नंतरच्या राजांनी त्या दिगंतकीर्ती सम्राटांचा पूर्वज म्हणून उल्लेख करण्याची सुवर्णसंधी कशाला सोडली असती?

खरंतर मूळ गुप्त राजवट मोडकळीला आलेली असताना, पण अस्तित्वात असतानाच एकीकडे ही राजवट उदयाला आली. ‘कृष्णगुप्त’ हा उत्तरकालीन गुप्त राजवटीचा संस्थापक मानला जातो. सुमारे इ. स. ४९० च्या आसपास त्याने आपली राजवट सुरू केली. मग, या उत्तर गुप्तबद्दल माहिती मिळते कुठे? तर बिहारमध्ये गयेजवळ.

‘अफसड’ या गावात एक शिलालेख १८८० मध्ये सापडला. तो ‘आदित्यसेन’ या राजाच्या कारकीर्दीतील आहे. तो इ. स. ६६० ते ६८० च्यादरम्यानचा आहे. तो शिलालेख सध्या ब्रिटिश म्युझियमध्ये आहे. या शिलालेखात कृष्णगुप्त, हर्षगुप्त, जीवितगुप्त, कुमारगुप्त, दामोदरगुप्त, महासेनगुप्त, माधवगुप्त आणि स्वत: आदित्यसेन अशा राजांची नावे आहेत. (Latest Marathi News)

यापैकी संस्थापक कृष्णगुप्तला केवळ ‘नृप’ म्हटले आहे. इतरांच्या नावा आधी ‘श्री’ एवढीच उपाधी आहे. मात्र, आदित्यसेनाचा उल्लेख ‘महाराजाधिराज’ असा आहे. तो उत्तर गुप्तवंशातील सगळ्यात यशस्वी राजा होता. त्याच्या कारकीर्दीत हा गुप्तवंश शिखरावर होता, असे दिसते.

अलीकडे १९७० मध्ये अफसड गावापाशीच उत्खननात एक प्राचीन विष्णुमंदिर सापडले. हे मंदिर आदित्यसेनानेच उभारले असावे, त्याच्यानंतर देवगुप्त, विष्णुगुप्त आणि अखेरचा राजा जीवितगुप्त-२, असे राजे होऊन गेले. इ. स. ७५० च्या सुमारास ही राजवट संपली.

या राजांपैकी कुमारगुप्तने समकालीन मौखरी वंशाच्या ईशान वर्माचा युद्धात पराभव केला, असे ‘अफसड’ लेखात म्हटले आहे. तसेच, महासेनगुप्ताने आसामच्या राजाचा युद्धात पराभव केला होता. पण नंतर स्थानेश्वरच्या (सध्याचे ठाणेसर-हरियाना) प्रभाकरवर्धनाने त्याला पराजित केले आणि महासेनगुप्तची मुले, कुमारगुप्त व माधवगुप्त यांना स्थानेश्वरचे राजकुमार राज्यवर्धन आणि हर्षवर्धन यांचे ‘सेवक’ म्हणून पाठवले.

तथापि हर्षवर्धनाने मैत्रीपूर्ण वागणे ठेवून माधवगुप्तला पाटलीपुत्रच्या गादीवर बसवले. मात्र तो हर्षाचा अंकित वा मांडलिक राजा होता. या घटनांचा उल्लेख बाणभट्टाच्या ‘हर्षचरितात’ केलेला आहे. पुढे हर्षाच्या मृत्यूनंतर आदित्यसेन गादीवर आला. त्याने हे मांडलिकत्व झुगारलेले दिसते. आदित्यसेनाची कारकीर्द यशस्वी होती. पण त्याला दक्षिणेतील

चालुक्यांनी पराजित केले होते. पुढे जीवितगुप्त-२ ला कनौजच्या यशोवर्मनाने पराभूत करून उत्तर गुप्तवंश संपुष्टात आणला. आश्चर्य या गोष्टीचे आहे, की २५० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असलेल्या या वंशाविषयी पुरेशी माहिती आपल्याला नाही. कदाचित, पूर्वीच्या बलाढ्य गुप्त साम्राज्याच्या तुलनेत या ‘उत्तर गुप्त’ची फारशी दखल इतिहासात घेतली गेली नाही. 

राजवंश भारती : उत्तर गुप्तवंश

सकाळ वृत्तसेवा

Vishnu Temple built by King Adityasena. & Inscription of Afsad.. It contains the information of Uttara Gupta.esakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

आदित्यसेन हा उत्तर गुप्तवंशातील सगळ्यात यशस्वी राजा होता, त्याचा उल्लेख ‘महाराजाधिराज’ असा आहे. त्याच्या कारकीर्दीत हा गुप्तवंश शिखरावर होता. आश्चर्य या गोष्टीचे आहे, की २५० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असलेल्या या वंशाविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. कदाचित पूर्वीच्या बलाढ्य गुप्त साम्राज्याच्या तुलनेत या ‘उत्तर गुप्त’ची इतिहासात फारशी दखल घेतली गेली नाही. (saptarang latest article on Northern Gupta dynasty)

स्कंदगुप्तच्या निधनानंतर बलाढ्य गुप्त साम्राज्याला उतरती कळा लागली. पुढचे राजे नामधारी ठरले. गुप्त राजवटीतील शेवटचा शिलालेख आढळला, तो बंगालमध्ये सन ५४३ मध्ये. त्यानंतरचा एकही शिलालेख गुप्तवंशाचा नाही. त्यांच्या कारकीर्दीतच ठिकठिकाणी मांडलिक राजा आणि सामंतांनी गुप्तांना झुगारून स्वत:ला स्वतंत्र राजे घोषित करायला सुरवात केली होती.

अशाच दुय्यम राजसत्तांपैकी एक ‘उत्तर गुप्त’ या नावाने ओळखली जाते. यांचे मूळ ठिकाण निश्चित सांगता येत नाही; पण ते बहुधा माळवा प्रांतातील असावे. त्यांना ‘गुप्त’ म्हटले गेले ते एवढ्यासाठी की, त्यांच्यापैकी जवळजवळ सर्व राजांच्या नावापुढे ‘गुप्त’ अभिधान लावलेले आहे.

पण, हा वंश तसा आधीच्या गुप्तवंशाशी संबंधित असल्याचा कोणताही पुरावा नाही. उलट तो तसा नसावा, असेच दिसते. कारण त्यांच्या एकाही शिलालेखात त्या श्रेष्ठ गुप्तवंशाचा साधा उल्लेखही नाही. जर तसा संबंध असता तर नंतरच्या राजांनी त्या दिगंतकीर्ती सम्राटांचा पूर्वज म्हणून उल्लेख करण्याची सुवर्णसंधी कशाला सोडली असती?

खरंतर मूळ गुप्त राजवट मोडकळीला आलेली असताना, पण अस्तित्वात असतानाच एकीकडे ही राजवट उदयाला आली. ‘कृष्णगुप्त’ हा उत्तरकालीन गुप्त राजवटीचा संस्थापक मानला जातो. सुमारे इ. स. ४९० च्या आसपास त्याने आपली राजवट सुरू केली. मग, या उत्तर गुप्तबद्दल माहिती मिळते कुठे? तर बिहारमध्ये गयेजवळ.

‘अफसड’ या गावात एक शिलालेख १८८० मध्ये सापडला. तो ‘आदित्यसेन’ या राजाच्या कारकीर्दीतील आहे. तो इ. स. ६६० ते ६८० च्यादरम्यानचा आहे. तो शिलालेख सध्या ब्रिटिश म्युझियमध्ये आहे. या शिलालेखात कृष्णगुप्त, हर्षगुप्त, जीवितगुप्त, कुमारगुप्त, दामोदरगुप्त, महासेनगुप्त, माधवगुप्त आणि स्वत: आदित्यसेन अशा राजांची नावे आहेत. (Latest Marathi News)

यापैकी संस्थापक कृष्णगुप्तला केवळ ‘नृप’ म्हटले आहे. इतरांच्या नावा आधी ‘श्री’ एवढीच उपाधी आहे. मात्र, आदित्यसेनाचा उल्लेख ‘महाराजाधिराज’ असा आहे. तो उत्तर गुप्तवंशातील सगळ्यात यशस्वी राजा होता. त्याच्या कारकीर्दीत हा गुप्तवंश शिखरावर होता, असे दिसते.

अलीकडे १९७० मध्ये अफसड गावापाशीच उत्खननात एक प्राचीन विष्णुमंदिर सापडले. हे मंदिर आदित्यसेनानेच उभारले असावे, त्याच्यानंतर देवगुप्त, विष्णुगुप्त आणि अखेरचा राजा जीवितगुप्त-२, असे राजे होऊन गेले. इ. स. ७५० च्या सुमारास ही राजवट संपली.

या राजांपैकी कुमारगुप्तने समकालीन मौखरी वंशाच्या ईशान वर्माचा युद्धात पराभव केला, असे ‘अफसड’ लेखात म्हटले आहे. तसेच, महासेनगुप्ताने आसामच्या राजाचा युद्धात पराभव केला होता. पण नंतर स्थानेश्वरच्या (सध्याचे ठाणेसर-हरियाना) प्रभाकरवर्धनाने त्याला पराजित केले आणि महासेनगुप्तची मुले, कुमारगुप्त व माधवगुप्त यांना स्थानेश्वरचे राजकुमार राज्यवर्धन आणि हर्षवर्धन यांचे ‘सेवक’ म्हणून पाठवले.

तथापि हर्षवर्धनाने मैत्रीपूर्ण वागणे ठेवून माधवगुप्तला पाटलीपुत्रच्या गादीवर बसवले. मात्र तो हर्षाचा अंकित वा मांडलिक राजा होता. या घटनांचा उल्लेख बाणभट्टाच्या ‘हर्षचरितात’ केलेला आहे. पुढे हर्षाच्या मृत्यूनंतर आदित्यसेन गादीवर आला. त्याने हे मांडलिकत्व झुगारलेले दिसते. आदित्यसेनाची कारकीर्द यशस्वी होती. पण त्याला दक्षिणेतील

चालुक्यांनी पराजित केले होते. पुढे जीवितगुप्त-२ ला कनौजच्या यशोवर्मनाने पराभूत करून उत्तर गुप्तवंश संपुष्टात आणला. आश्चर्य या गोष्टीचे आहे, की २५० वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असलेल्या या वंशाविषयी पुरेशी माहिती आपल्याला नाही. कदाचित, पूर्वीच्या बलाढ्य गुप्त साम्राज्याच्या तुलनेत या ‘उत्तर गुप्त’ची फारशी दखल इतिहासात घेतली गेली नाही. 

शुंग-कण्व काळातले स्तूप (भाग १)

सकाळ वृत्तसेवा

- विजय टिपुगडे

शुंग-कण्व काळाचा (इसवीसनपूर्व १८५ ते इसवीसनपूर्व २८) मागोवा घेताना त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. या काळातल्या वास्तुकलेचा विचार करता स्तूपनिर्मितीचा उल्लेख अपरिहार्य. स्तूप म्हणजे एखाद्या महापुरुषाची विशिष्ट आकाराची समाधी.

मात्र, पुढं गौतम बुद्धांचा संदेश, तसंच त्यांचं जीवन स्तूपांच्या रूपानं जनतेसमोर सतत राहावं, या मुख्य उद्देशानं स्तूपांची निर्मिती झाली. या स्तूपांमधून तत्कालीन वास्तुकलेचं आणि शिल्पकलेचं दर्शन घडतं.

सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर मौर्यसत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झाली. त्यांच्यानंतर गादीवर आलेले मौर्य राजे दुर्बळ होते. त्यामुळं साम्राज्यातले लहान विभाग स्वतंत्र झाले. मौर्य वंशाचा शेवटचा राजा बृहद्रथ याची,

त्याचाच सेनापती पुष्यमित्र शुंग यानं - सैन्याची पाहणी करत असताना - हत्या घडवून आणली. त्यानंतर पुष्यमित्र स्वत: मगध देशाचा राजा झाला. शुंग वंशाचं राज्य पाटलीपुत्र इथून सुरू झालं. शुंग हे ब्राह्मण समुदायाचे होते. त्यांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला.

पुष्यमित्र हा शूर आणि पराक्रमी सेनानी होता. त्यानं प्रसिद्ध परकीय ग्रीक आक्रमक सेनापती मिनॅंडर याचा पराभव करून त्याला भारताबाहेर पिटाळलं व एका मोठ्या साम्राज्याची स्थापना केली. त्याचं साम्राज्य नेपाळपासून नर्मदेपर्यंत व जालंधरपासून बंगालपर्यंत पसरलेलं होतं.

तो लोकप्रिय होता. आपलं सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी त्यानं वैदिक प्रथेनुसार अश्वमेध यज्ञही केला होता. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र यानं विदर्भ जिंकून साम्राज्याची आणखी वाढ केली. शुंग वंशाचं राज्य इसवीसन पूर्व १८५ ते इसवीसन पूर्व ७३ पर्यंत असं एकूण ११२ वर्षं चाललं. शुंग वंशातला शेवटचा राजा देवभूती हा व्यसनी होता. त्याच्या कर्तृत्वशून्यतेमुळं त्याचा ब्राह्मण प्रधान वासुदेव कण्व यानं त्याची हत्या करून कण्व वंशाची सत्ता प्रस्थापित केली.

या कण्व वंशाचं राज्य अत्यल्प काळ, म्हणजे केवळ ३६ वर्षं, टिकलं. इसवीसनपूर्व २८ मध्ये सातवाहन राजानं मगधावर स्वारी केली व कण्व वंशातला शेवटचा राजा सुशर्मा याची हत्या केली. एकूण, या कालखंडात वर्चस्वाची लढाई झालेली दिसून येते.

शुंग आणि कण्व हे राजे वैदिक धर्माचे अनुयायी होते. त्यांनी आणि सातवाहन राजांनी अश्वमेध यज्ञ करून यज्ञाची प्रथा पुन्हा सुरू केली. तरीही बौद्ध-जैन या धर्मांचा प्रभाव जास्त असल्यामुळं यज्ञासाठी हिंसा करणं ही बाब तत्कालीन जनतेला आवडत नव्हती.

परकीयांच्या स्वाऱ्यांमुळे आलेल्या नवीन धर्मकल्पना, भक्तिपंथाचा उदय, वैदिक व नास्तिक मतांचा प्रभाव यामुळे वैदिक धर्माचं स्वरूप बदलणं आवश्यक होतं. याच्याच परिणामस्वरूप जुन्या वैदिक धर्माचं नवीन, सर्वसमावेशक अशा हिंदू धर्मात परिवर्तन झालं.

परकीयांनाही या धर्मात सामावून घेण्यात आलं. शैव, वैष्णव या पंथांत गणपती, दुर्गा, शक्ती, सूर्य, ब्रह्मा इत्यादी देवतांच्या भक्तिपंथाची भर पडली. जातिसंस्था रूढ झाल्या. ब्राह्मणांना सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालं. विविध जातींचे आचार-विचार नियमन सांगणारे स्मृतिग्रंथ याच कालखंडात निर्माण झाले.

वास्तुकला या काळातल्या वास्तुकलेचा विचार करता स्तूपनिर्मितीचा उल्लेख करावा लागेल. स्तूप म्हणजे एखाद्या महापुरुषाची विशिष्ट आकाराची समाधी. इतिहासपूर्वकाळात मृत व्यक्तीच्या शरीराचं दफन किंवा दहन केल्यानंतर त्या अवशेषावर मातीचा किंवा दगडांचा ढिगारा करण्याची प्रथा होती. तिच्यामधूनच स्तूपाचा विशिष्ट आकार उत्क्रान्त झाला.

जैनधर्मीय लोक स्तूप उभारत असत. मात्र, सम्राट अशोकांनी भव्य स्तूप बांधून त्यांना भेटी देण्याचा प्रकार सुरू केला. लोकांना तीर्थयात्रा सुलभ व्हावी या उद्देशानं स्तूप विविध नगरांत मुख्य रस्त्याजवळ उभारण्यात आले.

गौतम बुद्धांचा संदेश, तसंच त्यांचं जीवन स्तूपांच्या रूपानं जनतेसमोर सतत राहावं, हाच स्तूप उभारण्यामागचा प्रमुख उद्देश होता. सम्राट अशोकांनी अनेक स्तूप बांधले. त्यांपैकी सर्वात महत्त्वाचा सांची इथला महास्तूप होय.

सांचीच्या स्तूपाच्या पूर्वतोरणावरच्या ‘कपिलवस्तूकडं पुनरागमन’ या उठावशिल्पावरून तत्कालीन नागरी वास्तूची कल्पना येते. अनेक मजली इमारती, गच्ची व कठडे, त्यांच्यावरचं चैत्यकमानींचं आलंकरण आदी गोष्टी वास्तुकलेतली प्रगती स्पष्टपणे दर्शवतात.

याशिवाय, सम्राट अशोकांनी प्रोत्साहन दिलेल्या स्तूपबांधणीचा विकास या काळात झाला हे प्रकर्षानं जाणवतं. सांचीचा स्तूप उभारण्यात आला, तसंच भरहुत, बुद्धगया, अमरावती, नागार्जुनकोंडा इत्यादी अनेक महत्त्वाच्या स्तूपांची उभारणी झाली.

स्तूपाचं मूळ स्वरूप समाधीचं होतं. गौतम बुद्ध किंवा त्यांचे महान शिष्य वा भिक्षू यांच्या अस्थी, रक्षा, केस इत्यादी पार्थिव अवशेष एखाद्या कलशात ठेवले जात व तो कलश जमिनीखाली ठेवून त्यावर स्तूपाची वास्तू बांधण्यात येई.

सर्वात खाली चौरस किंवा दंडगोलाकार पाया बांधला जाई. या पायावर एक अर्धगोलाकार अंडाकृती घुमटासारखी रचना असे. खालच्या पायाला मेंढी किंवा दंड म्हणत, तर वरच्या अर्धगोलाकार भागाला अंड अशी संज्ञा आहे.

या वर्तुळाकार भागाच्या मध्यावर एक छोटा चौरसाकृती मंडप असे. त्याला ‘हार्मिका’ असं म्हणतात‌. हार्मिकेच्या मध्यावर एक खांब किंवा यष्टी उभी करून तिच्यावर एक किंवा तीन छत्र्या असत. या रचनेला ‘छत्रावली’ असं नाव आहे.

स्तूपाचा पायाही अंडाकृती व संपूर्णपणे भरीव असे. आतला भाग कच्च्या विटांनी बांधून त्यावर बळकटपणासाठी पक्क्या विटांचे थर व चुन्याचा गिलावा केला जाई. स्तूपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ‘प्रदक्षिणापथ’ असे. त्याच्या बाहेर कठडे उभारले जात. आत प्रवेश करण्यासाठी या कठड्यांच्या चार दिशांना भव्य अशी आलंकृत प्रवेशद्वारं असत.

त्यांना ‘तोरण’ असं संबोधलं जातं. कठड्यांना ‘वेदिका’ असं म्हणतात. काही मोठ्या स्तूपांच्या ठिकाणी मेंढीवर दुसरा एक प्रदक्षिणापथ बांधलेला आढळतो. त्याच्याही बाहेरच्या बाजूला कठडा असतो. सुरुवातीला कठडे व तोरणं लाकडी असत. मात्र, शुंगकाळात ते संपूर्णत: दगडाचे तयार करण्यात आले.

(लेखक हे चित्रकार, स्तंभलेखक, कलाभ्यासक आहेत.)

भाजे लेणी : अद्भुत इतिहासाचं दर्शन

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी

सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झालेलं स्थापत्य आपण मागील काही लेखांमध्ये पाहिलं. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोकाच्या काळात निर्माण झालेल्या लेणी स्थापत्यानं फार मोठा बदल घडवून आणला. पण, या लेणींचा जन्म जरी बिहार राज्यात झाला असला, तरी त्या प्रकारच्या लेणींची निर्मिती महाराष्ट्रात किंवा दख्खनच्या भूभागात मोठ्या प्रमाणात झाली.

म्हणजे, आपल्या देशात आजपर्यंत सापडलेल्या अठराशे लेणींपैकी जवळपास अकराशे लेणी महाराष्ट्रात निर्माण झाल्या आहेत. लेणींचे अनेक प्रकार आहेत. आपण लेणी असा विचार करताना फक्त एखादा स्तूप असलेली किंवा अनेक खोल्या असलेली रचना डोळ्यांसमोर आणतो. पण, या सर्वांना विशिष्ट नावं आहेत. जिथं स्तूपाची निर्मिती होते, ते चैत्यगृह.

जिथं बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी व्यवस्था केलेली असते, ते विहार. जिथं एकत्र बसण्याची व्यवस्था असते किंवा जिथे एकत्र जमण्यासाठी मोठ्या खोलीची रचना केली असते ती उपत्थानशाळा, जेवणाची व्यवस्था असलेल्या लेणीला भोजनशाळा, मंडप, पाणीयमंडप, उदपानशाळा आणि असे कित्येक प्रकार आपल्याला लेणींमध्ये आढळतात. यांच्यावरून सदर लेणी आणि तिथं राहणाऱ्या लोकांचं दैनंदिन जीवन कसं असावं, याचा अंदाज आपण लावू शकतो.

महाराष्ट्राचा विचार केल्यास, पुणे जिल्ह्यात दख्खन भागातील सर्वांत पहिल्या लेणीपैकी एकाची निर्मिती झाली. लोहगड आणि विसापूर किल्ल्याच्या अगदी जवळ असलेली भाजे लेणी. एकूण २६ लेणींचा या लेणीसमूहात समावेश होतो. प्राचीन बोरघाट मार्गावर निर्माण करण्यात आलेल्या इथल्या लेणींमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी आहेत.

गजपृष्ठाकार आकारात निर्माण केलेलं चैत्यगृह महत्त्वाचं आहे. याच्या छतावर अर्धगोलाकार आकारात लावलेली लाकडे ही जवळपास तेवीसशे वर्ष जुनी आहेत. भाजे लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व तिसरे शतक ते इसपू दुसऱ्या शतकात झाली.

जेव्हा या चैत्याची निर्मिती झाली, त्याच वेळेस या लाकडांना छतावर लावण्यात आले. एका बाजूला स्तूप, त्याच्या बाजूनं स्तंभाची रांग, बाहेरील बाजूस काही प्रतिमा आणि थोड्याफार प्रमाणात दिसून येणारं रंगकाम असं एकंदरीत चैत्याचं स्वरूप आहे.

विशेष गोष्ट म्हणजे, अनेक अभ्यासकांच्या मतानुसार दख्खन भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात खोदण्यात आलेलं हे सर्वांत पुरातन चैत्यगृह आहे. चैत्य कमान मात्र आज अस्तित्वात नाही. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या लेणीमधून स्थापत्यकीय चळवळीचं एकंदरीत स्वरूप समजून घेण्यास मदत होते.

चैत्याला मागे टाकून लेणी क्रमांक २२ कडं निघाल्यास वाटेत एकाच जागी अनेक स्तूपांची एकत्रित रचना केल्याचं पाहायला मिळतं. एकाच जागेवर दहा- बारा स्तूप एकत्रितपणे निर्माण केले आहेत. यांना स्मृतिस्तूप विथीका असं म्हणतात.

एखाद्या बौद्ध भिख्खूचं किंवा त्या लेणी समूहात राहिलेल्या एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यास, त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ अशाप्रकारच्या स्तूपांची निर्मिती करण्यात येते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे स्तूप दिसतात.

पण भाजे येथील स्मृतिस्तूपांची रचना ही भव्य, सुबक आणि आकर्षक आहे. त्यापैकी काहींवर ब्राह्मी लिपीमध्ये लेख कोरला आहे. धम्मगिरी, संघदिन यांसारख्या बौद्ध भिक्खूची नावं यावर कोरलेली आहेत. त्यांचं वास्तव्य या भाजे लेणीसमूहात होते.

येथील सर्वांत आकर्षक लेणी १९ क्रमांकाची आहे. हा विहार आहे. बौद्ध भिख्खू आणि साधकांच्या राहण्याची व्यवस्था इथं केली आहे. पण तत्कालीन विहाराच्या स्थापत्यकीय नियमांना छेद देत इथं बऱ्याच गोष्टींना पहिल्यांदाच स्थान देण्यात आलंय.

या लेणीच्या बाहेर एका वऱ्हांड्याची रचना केलेली आहे. त्याचं छत गजपृष्ठाकार आहे. आतमध्ये दोन बाजूला दोन खोल्यांची रचना केलेली आहे. त्यातील एका खोलीच्या बाहेर दोन प्रतिमांचं अंकन केले आहे. एक प्रतिमा चार अश्वांच्या रथावर आरूढ झालेली असून, चाकांच्या खाली एका असुराचं निर्दालन करतानाचं दृश्य कोरले आहे तर दुसऱ्या प्रतिमेमध्ये एक व्यक्ती हत्तीवर आरूढ झालेला दाखवला आहे.

काही अभ्यासकांच्या मते, या दोन प्रतिमा सूर्य आणि इंद्राच्या असाव्यात. तर काही अभ्यासकांच्या मते, या बौद्ध जातक कथेतील प्रसंगावर आधारित आहेत. इसपू तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील धार्मिक व सामाजिक संरचना तसेच,

बौद्ध लेणींच्या परिसरात खोदण्यात आलेल्या या प्रतिमांचा विचार करता दुसरं मत हे वास्तव्याच्या जवळ जाणारे असावे, असं अभ्यासक नमूद करतात. यांच्यासोबतच, काही नृत्य व वादन करणाऱ्या लोकांचेही अंकन केले आहे. त्यांचे अलंकार, कपडे आणि एकूणच रचनेवर व्यापारामुळं पडलेला प्रभाव लगेच जाणवतो.

या लेणी समूहापासून थोड्या लांब अंतरावर लेणी क्रमांक २६ आहे. बऱ्याच अभ्यासकांचं असं मत आहे, की भाजे लेणी समूहातील ही सर्वांत पहिल्यांदा खोदलेली लेणी असावी. या लेणीच्या मार्गावर दोन ठिकाणी पाणी अडवण्यासाठी प्राचीन काळात केलेली बांधाची रचना पाहायला मिळते.

एवढ्या मोठ्या संख्येनं व्यापारी, बौद्ध भिख्खू आणि इतर लोकांची या परिसरात रेलचेल असताना त्यांच्या दैनंदिन पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाण्यांच्या टाक्यांबरोबरच अशी रचना करण्यात येते. कोंढाणे, कान्हेरी, पितळखोरा यांसारख्या कित्येक लेणींमध्ये हे बांध आपल्याला पाहायला मिळतात.

लोणावळा किंवा मळवली स्थानकापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेणी दख्खनच्या इतिहासाच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात दिसून येणारी आणि सुस्थितीत असलेली ही सर्वांत पुरातन धार्मिक वास्तू असल्यामुळं भाजे येथील लेणीचं महत्त्व प्रचंड आहे.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

पूर्वेकडचे नंदनवन ‘कंबोडिया’

अवतरण टीम

- विशाखा बाग

कंबोडिया म्हणजे भारतीय संस्कृतीशी पौराणिक नाळ जोडून असलेला देश. जगातील सर्वात पुरातन हिंदू मंदिर समूह तिथे आपल्याला पाहता येतो. शहरात जागोजागी तुम्हाला मंदिरे बघायला मिळतात. इथली पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी मंदिरे अन् पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात.

पूर्वेकडचे देश भारतीयांसाठी नवीन नाहीत. जवळच असलेले थायलंड, सिंगापूर, मलेशिया आणि इंडोनेशियासह आता व्हिएतनाम अन् कंबोडियामध्येही अनेक भारतीय पर्यटक दिसायला लागले आहेत. ऑफिसच्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने मी या देशांना अनेकदा भेट दिली आहे.

बौद्ध संस्कृतीशी असलेल्या साधर्म्यामुळे या देशांतील पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी मंदिरे अन् पर्यटन स्थळे भारतीयांना आकर्षित करतात. त्याचबरोबर हे सर्वच देश लहान असल्यामुळेही त्यांना उत्तम समुद्रकिनारे लाभले आहेत.

ते सर्व किनारे सुंदर आणि स्वच्छ राखण्यात आले आहेत. अशा सर्वच देशांची बहुतांश प्रमाणात अर्थव्यवस्था पर्यटकांवरच अवलंबून आहे आणि त्यामुळे त्यांना पूर्वेकडचे नंदनवन असेसुद्धा संबोधले जाते.

कंबोडिया हा असाच एक भारतीय संस्कृतीशी पौराणिक नाळ जोडून असलेला देश. जानेवारीत कंबोडियामध्ये जाण्याची संधी चालून आली आणि जगातील सर्वात पुरातन असा हिंदू मंदिर समूह बघण्याचा योग जुळून आला.

हजारो वर्षांपासून क्ख्मेर राजघराण्याची सत्ता असलेला हा देश थायलंडच्या बाजूला मॅकॉग नदीच्या त्रिभुज प्रदेशात वसलेला आहे. अजूनही या देशाची बोलीभाषा आणि लिहिण्याची लिपीसुद्धा क्ख्मेर आहे.

पौराणिक काळात हजारो वर्षांपूर्वी भारतवर्षातून दक्षिणेच्या बाजूने गेलेले कंबू स्वयंभू या ऋषींनी तेव्हा कंबोज या राजघराण्याची आणि राज्याची स्थापना केली. वेदांमध्ये आणि अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेला कंबूज देश म्हणजेच आताचा कंबोडिया.

अंगकोर वाट हा मंदिर समूह सीॲम रीप या कंबोडियाच्या शहराजवळ आहे. सीॲम रीप हे कंबोडियामधले क्रमांक दोनचे मोठे शहर आहे. सीॲम रीप या नदीजवळ ते वसलेले असल्यामुळे त्याला हे नाव पडले.

शहरात जागोजागी तुम्हाला अनेक ठिकाणी मंदिरे बघायला मिळतात. शहरातील ५० टक्के लोकसंख्या रोजगारासाठी पर्यटन व्यवस्थेवर अवलंबून आहे. २००४ पासून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वाहतूक मुख्यतः हे शहर, अंगकोर वाट हा मंदिर समूह आणि तानले सॅप हा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव बघण्यासाठी सुरू झालेली आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्याचबरोबर युनेस्को जागतिक वारसा अन् पर्यटन स्थळांच्या यादीत या मंदिर समूहाचे नाव आहे. क्ख्मेर राजघराण्याच्या दुसऱ्या सूर्यवर्मन राजाने मुख्यतः विष्णूसाठी म्हणून ही मंदिरे बांधायला घेतली.

१६२ हेक्टरमध्ये पसरलेला या मंदिर समूहामध्ये पाच मुख्य मंदिर आणि गॅलरीवजा लांबच लांब पसरलेली मंदिरे आहे. देवांचे निवासस्थान असलेला मेरू पर्वत आणि मुख्यतः विष्णूचे निवासस्थान म्हणून या मंदिरांची निर्मिती करण्यात आलेली होती.

मेरू पर्वताशी साधर्म्य साधण्यासाठी बांधलेले पाचही मंदिरांचे कळस उठून दिसतात. लांबच लांब पसरलेल्या गॅलरीसारख्या मंदिरांत मुख्यतः पौराणिक हिंदू धर्मातील विविध कथा आणि महत्त्वाचे प्रसंग कोरलेले आहेत.

मंदिरांमधील गोपूर आणि गॅलरीमध्ये रामायण-महाभारतातील कथा, वेदांमधील वेगवेगळे ऋषी आणि देवांच्या मूर्तींचे कोरीव काम खूपच सुंदर अन् बघण्यासारखे आहे. सूर्यवर्मन राजाने जेव्हा हा मंदिर समूह बांधण्यासाठी घेतला तेव्हा या शहराचे नाव यशोधरपूर असे होते.

आताचे अंगकोर हे नाव नगर या शब्दाचा अपभ्रंश होत पडलेले आहे आणि वाट म्हणजे मंदिरांच्या आजूबाजूचा रिकामा परिसर किंवा जागा. तेव्हा या मंदिर समूहाला सूर्यवर्मन राजाने दिलेले नाव होते ‘परम विष्णू लोक’. कालांतराने काही शतकांनी हिंदूधर्मीय राजांनी बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केले.

त्यानंतर प्रजेनेसुद्धा बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केले. यामुळेच हे मंदिर आता हिंदू आणि बौद्ध धर्मीय मंदिर म्हणून ओळखले जाते. पाचही सर्व मोठ्या मंदिरांमध्ये विष्णूच्या मूर्ती आणि शंकराच्या पिंडी अजूनही बघायला मिळतात.

इथे गेल्यानंतर मंदिर बघण्यासाठी साधारण दोन ते तीन तास लागतात; पण इतिहास समजून घेण्यासाठी ‘गाईड’ करणे अत्यावश्यक आहे. ही सर्व माहिती आपल्याला गाईड व्यवस्थितपणे सांगतात. विदेशी पर्यटकांना हिंदू आणि बौद्ध धर्माबद्दल विशेष आकर्षण आहे. त्यामुळे बरेच विदेशी पर्यटक या ठिकाणी आलेले दिसतात.

मनसोक्त फोटो काढून आणि मंदिरांचा इतिहास समजून घेऊन आम्ही शहरातील म्युझियम आणि इतर मंदिरे बघण्यासाठी गेलो. या मंदिराजवळ असलेले अजून एक महत्त्वाचे पर्यटनाचे आकर्षण म्हणजे बलून राईड. जमिनीपासून साधारण बलूनने आठशे मीटर उंचीवर जाऊन आपण मंदिरांचा आजूबाजूचा परिसर आणि मंदिर वरून बघू शकतो. कंबोडियाला गेल्यानंतर हा बलून राईडचा अनुभव घ्यायला विसरू नका.

मंदिर बघून आल्यानंतर संध्याकाळी आम्ही कंबोडियामधील पारंपरिक डान्स शो बघण्यासाठी गेलो. थायलंड, कंबोडिया या देशांमध्ये पारंपरिक नृत्य हे पौराणिक कथांवर आधारित असते. रामायण आणि महाभारतातील वेगवेगळ्या गोष्टी नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येतात.

हा डान्स शो बघत असतानाच कंबोडियामधील लोकल कुझीन म्हणजेच स्थानिक वेगवेगळे पदार्थ चाखायलासुद्धा मिळतात. या संपूर्ण कार्यक्रमाच्या तिकिटामध्ये रात्रीचे जेवण आणि पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम समाविष्ट असतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वेकडच्या देशांमधील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा तलाव ‘तोंनले सॅप’ बघण्यासाठी गेलो. शहरापासून जवळपास दीड तासावर हा तलाव आहे. या तलावातच फ्लोटिंग व्हिलेज म्हणजेच तरंगते गाव आहे.

तलावाच्या पाण्यावरच बांधलेल्या झोपड्या, त्यामध्ये सुरू असलेले स्थानिकांचे मासेमारीचे काम आणि इतर स्थानिक काम, येथील राहण्याची आणि जगण्याची पद्धत हे सर्व आपल्याला बघायला मिळते. कंबोडियामध्ये अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गरिबी दिसते. फ्लोटिंग व्हिलेजमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन हे नक्कीच खडतर होते.

हे लोक इथे वर्षानुवर्षे कसे राहत असतील, हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडल्याशिवाय राहत नाही. घरांबरोबरच या तरंगत्या गावात शाळा आणि दवाखानासुद्धा आहे; पण आता हळूहळू पुढची पिढी या गावांमधून बाहेर बघण्याचे स्वप्न बघत आहे आणि त्यासाठी कष्टही करत आहे.

कंबोडियन करन्सी म्हणजे रियालची किंमत ही आपल्या रुपयापेक्षा कमी आहे. म्हणजेच एका रुपयामध्ये जवळपास ४८ रियाल आपल्याला वापरायला मिळतात आणि याचमुळे नाईट मार्केटमध्ये अन् लोकल मार्केटमध्ये पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. अनेक पर्यटक इथून कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत स्वस्तामध्ये खरेदी करतात.

पर्यटकांसाठी कंबोडियामधले अजून एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे विविध प्रकारचे स्पा आणि मसाज सेंटर. दिवसभर फिरल्यानंतर स्थानिक कंबोडियन मसाज नक्कीच करायला हवा. अनेक भारतीय वर्षानुवर्षे इथे स्थायिक झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय खाद्यपदार्थ अन् रेस्टॉरंटसुद्धा मुबलक प्रमाणात इथे आहेत. भारतीय पर्यटकांसाठी पटकन व्हिसा मिळण्याचे आणि त्याचबरोबर किफायतशीररीत्या फिरण्याचे ठिकाण म्हणून कंबोडिया नावारूपाला येत आहे.

gauribag7@gmail.com (लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

मौर्यकला (भाग 2)

सकाळ डिजिटल टीम

esakal

बिहारच्या दीदारगंज इथं सापडलेली यक्षी ही पिवळ्या वालुकाश्म दगडात मौर्यकालीन झिलईसह घडवली गेली आहे.

अजेय दळवी ajeydalvi2@gmail.com

एकसंध वालुकाश्म दगडात कोरलेल्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांच्या शिल्पांबरोबरच तत्कालीन मानवी शिल्पांकनसुद्धा मौर्यकलेत दिसून येतं. याचंच उदाहरण म्हणजे यक्ष-यक्षिणीच्या मूर्तींची घडण होय. यामध्ये उत्स्फूर्तता, कमालीची भव्यता, जोम आणि जिवंतपणा जाणवतो. मौर्यकाळातल्या सर्वात प्राचीन यक्षाची तांबड्या वालुकाश्मात घडवली गेलेली मूर्ती मथुरेजवळच्या परखम इथं सापडली. या यक्षाचं नाव बहुधा मणिभद्र हे असावं.

गळ्यात रत्नमाला, कमरेच्या वरचा भाग अनावृत असून कमरेभोवती गुंडाळलेल्या वस्त्राची दोन टोकं खाली धोतरावर लोंबत आहेत. शिल्पाचे दोन्ही हात तुटलेले आहेत - तरीही, शिल्पकारानं मूर्ती उत्स्फूर्तपणे सरळ घडवलेली असल्यामुळं - त्या शिल्पात अतिमानवी, शक्तिशाली रूप साकार झालं आहे. मोठ्या आकारात शिल्प घडवण्याचा कदाचित हा भारतीय शिल्पकारांचा सुरुवातीचा प्रयत्न असावा असं वाटतं.

पाटणा इथं सापडलेली यक्षमूर्ती इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकातली आहे. शिर आणि दोन्ही हात तुटलेले, स्थूल शरीर अशा प्रकारच्या या भव्य यक्षमूर्तीचा वरच्या भागावर आणि पावलांवर चकचकीत झिलई पाहायला मिळते. अशी झिलई हे सर्व मौर्य शिल्पांचं वैशिष्ट्य होय. चवरी ढाळणाऱ्या या सेवकाच्या गळ्यात जाडजूड माळ, कमरेभोवती धोतरासारखं वस्त्र असून, नेसलेल्या वस्त्रावर कंबरपट्टा आहे. डाव्या खांद्यावर पट्टा आहे. तो सेवक असल्याचं या वैशिष्ट्यांवरून स्पष्ट होतं. वस्त्रावरच्या कोरीव कामातल्या खोदलेल्या समांतर रेषा इराणी शैलीच्या आहेत. मात्र, शरीराची घडण भारदस्त आणि पूर्णपणे भारतीय आहे.

बिहारच्या दीदारगंज इथं सापडलेली यक्षी ही पिवळ्या वालुकाश्म दगडात मौर्यकालीन झिलईसह घडवली गेली आहे. कमरेच्या वरच्या शरीराचा भाग हा दागदागिन्यांच्या कौशल्यपूर्ण कोरीव कामासह असून पूर्णपणे अनावृत आहे. चेहरा वर्तृळाकृती घाटाचा असून त्याचे अवयव आणि केशकलाप अत्यंत कुशलतेनं कोरलेले आहेत. डाव्या हातात चामर असून उजवा हात खांद्यापासून तुटलेला आहे. वक्षस्थळांवरून रुळणारा रत्नहार, कमरेचं वस्त्र, कंबरपट्टा, पायातले तोडे आणि हातावरून जमिनीपर्यंत दर्शवलेलं उत्तरीय या सगळ्याचं कोरीव काम खूप तपशिलानं केलेलं आहे.

बांधेसूद, प्रमाणबद्ध कंबर ही निरोगी शरीराचं निदर्शक आहे. या सर्व तपशिलावरून तत्कालीन स्त्रीसौंदर्यविषयक कल्पना आणि मौर्यशिल्पांची अत्यंत प्रगत अवस्था या मूर्तीत पाहायला मिळते. या सर्व कलाकृतींमध्ये शिखर गाठणारा, आपल्या सर्वांच्या आत्मीयतेचा विषय ठरतो तो ‘सारनाथचा सिंहस्तंभशीर्ष’. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी सारनाथ इथल्या मृगोद्यानात पहिलं प्रवचन दिलं होतं. त्याचं स्मरण म्हणून सम्राट अशोकांनी हा स्तंभ चुनार खाणीतल्या एकसंध पिवळ्या वालुकाश्म दगडात उभारला आहे.

या सिंहस्तंभशीर्षाचे तीन प्रमुख भाग आहेत. सर्वात खाली घंटेच्या आकाराचं उलटं कमळ, त्यावर खालच्या कड्यापेक्षा थोडं मोठं असणारं वरचं दुसरं कडं. त्याच्या वर अनियमित अष्टकोनी शीर्षस्तंभफलक आहे. या फलकाच्या चारही दिशांना चार धर्मचक्रे उठावात कोरलेली आहेत. प्रत्येक दोन चक्रांच्या मध्ये एका धावत्या प्राण्याची - उदाहरणार्थ : बैल, घोडा, सिंह आणि हत्ती या चार प्राण्यांची - सुरेख शिल्पे उठावात कोरलेली आहेत. हे प्राणी धावत्या अवस्थेत दाखवल्यामुळे त्यांची गती सूचित होते.

स्तंभशीर्षफलकावर पाठीला पाठ लावलेले चार सिंह चार दिशांना तोंड करून दिमाखात उभे आहेत. सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये सिंह हे सूर्याचं प्रतीक मानलं गेलं आहे. ‘अधर्माचा काळोख धर्मरूपी सिंह नष्ट करतो,’ या कल्पनेला अनुसरून सिंहाची योजना केलेली आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. सिंहाचा रुबाबदार; परंतु काहीसा ताठर आविर्भाव, मुखवट्याप्रमाणे भासणारे त्यांचे चेहरे, नाकपुड्यांखालचा ओठाचा भाग समांतर व वक्ररेषांनी दाखवण्याची पद्धत, डोळ्यांचा त्रिकोणी आकार आणि या कोरलेल्या शिल्पाची आरशासारखी चकचकीत झिलई हे तत्कालीन सर्व इराणी शिल्पांमध्ये पाहायला मिळतं.

या चार सिंहांच्या डोक्यावर धर्मचक्र होतं. या स्तंभाच्या उभारणीमागं धर्मप्रसाराचा उद्देश स्पष्ट आहे. जनतेसमोर राजाज्ञा ठेवण्याची इराणी प्रथा सम्राट अशोक यांनी स्वीकारली; मात्र, तिचा उपयोग स्वतःचं राजकीय व्यक्तिमाहात्म्य वाढवण्यासाठी न करता केवळ धर्मप्रसारासाठी केला हे त्यांचं श्रेष्ठत्व ठरतं. ‘बराबर डोंगरा’तल्या गुहा सम्राट अशोक यांनी, बौद्ध मत न मानणाऱ्या आजीवक पंथाच्या भिक्षूंना राहण्यासाठी कोरल्या होत्या हे आवर्जून लक्षात घेण्यासारखं आहे. हे सिंहस्तंभशीर्ष उदारमतवादी भारतीय संस्कृतीचं योग्य प्रतीक आहे हे लक्षात घेऊन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हे महान शिल्प भारत सरकारनं राजमुद्रा म्हणून स्वीकारलं.

आक्रमक म्हणून आलेल्या ग्रीकांसोबत तत्त्ववेत्तेही होते. कलाकारही होते. त्यांत पर्शियन कलाकारांचाही समावेश होता. शत्रू म्हणून आलेल्यांकडूनही उचित ते वेचण्याचं सामर्थ्य आपल्या समाजात प्राचीन काळापासून असल्याचं दिसून येतं. त्यामुळं तत्कालीन मौर्यकलेला ग्रीक आणि पर्शियन कलागुणांची जोड मिळाली आणि आपली भारतीय कला अधिक समृद्ध होत गेली.

(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)

अपूर्वाई अशोककालीन स्तंभांची!

सकाळ डिजिटल टीम

अशोकानं काही स्तंभांवर आपले लेख कोरून ठेवले आहेत, तर काही स्तंभांवर लेख दिसून येत नाहीत. अभ्यासकांच्या मते, काही स्तंभ हे अशोकपूर्व काळातील असावेत.

केतन पुरी ketan.author@gmail.com

सम्राट अशोकाच्या (Emperor Ashoka) काळात खोदण्यात आलेल्या लेणींविषयी आपण मागील लेखात माहिती घेतली. अशोकानं लेणींची उभारणी केली, स्तूप उभारले. बौद्ध धर्माच्या (Buddhism) प्रचार आणि प्रसारासाठी जे जे शक्य आहे ते सगळं केलं. यांच्यासोबतच अशोकानं आणखी एका गोष्टीमध्ये आपलं भरीव योगदान दिलं, ज्याला आज आपण ‘अशोककालीन स्तंभ’ म्हणून ओळखतो. स्तंभांची उभारणी करण्यामागं अनेक कारणं आहेत. ऋग्वेदात या स्तंभांना ‘युप’ या नावानं संबोधण्यात आलंय.

यज्ञ करताना किंवा कोणत्याही प्रकारचा यज्ञविधी करताना जमीन आणि आकाश यांच्यामधील अक्ष म्हणून हा युप यज्ञ करणाऱ्या व्यक्तीच्या मार्फत उभा करण्यात येत असे. अशोकाचे स्तंभ (Pillars of the Ashoka Period) आणि त्यांची व्याप्ती ही मौर्य साम्राज्याच्या प्रदेशात असल्याचं आपल्याला दिसून येतं. मौर्य कालखंडानंतर या स्तंभांना त्यांच्या मूळ जागेवरून हलवल्याचे उल्लेख इतिहासात वाचायला मिळतात.

फा हीआन हा परकीय प्रवासी जेव्हा भारतात आला, तेव्हा त्यानं या स्तंभाची पूजा होताना पाहिल्याचं लिहून ठेवलंय. सारनाथ, कोसंबी, पाटलीपुत्र यासोबतच हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) कोपरासारख्या ठिकाणी सुद्धा अशोकाचे स्तंभ पाहिल्याचं तो सांगतो. अल बरुनीनं हे स्तंभ प्रत्यक्ष पाहिले होते आणि ते कोणत्या तरी धातूपासून बनवले असावेत, असं निरीक्षण त्यानं नोंदवलंय. यानंतर चौदाव्या शतकात मोठी गंमत झाली. फिरोझ शाह तुघलक याच्या कारकीर्दीत अशोकाचे काही स्तंभ त्याच्या मूळ जागेवरून हलवण्याचे आणि या तुघलकाच्या राजधानीत किंवा त्यानं बांधलेल्या किल्ल्यात आणून ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ‘सिरत इ फिरुझशाही’ आणि ‘तारीख इ फिरुझशाही’सारख्या ग्रंथांमध्ये याची सविस्तर वर्णनं वाचायला मिळतात. टोप्रा येथील स्तंभ दिल्लीला आणण्यासाठी फिरोझशाहनं काय काय खटाटोप केले, याचे सविस्तर वर्णन या समकालीन ग्रंथामध्ये केले आहे.

लांब चाळीस चाकांची एक गाडी करण्यात आली. टोप्रा येथील स्तंभ खोदण्यात आला. तो फुटू नये किंवा त्याला इजा होऊ नये, म्हणून कापसाच्या लादीत गुंडाळण्यात आले. झाडांच्या सालीने तो बांधून ठेवण्यात आला. हजारपेक्षा जास्त माणसे या कामासाठी लावली होती. पायदळ आणि घोडदळातील शेकडो सैनिक या मोहिमेवर नियुक्त केले होते. गंगा ओलांडताना नावांचा पूल तयार करण्यात आला होता. हे वर्णन इतके सविस्तर आहे, की या घटनेचे संपूर्ण चित्रण आपल्या नजरेसमोर सहज उभे राहते. त्याने या स्तंभावरील अशोकाचा लेख वाचण्याचा प्रयत्नही केला होता, असे नोंदवून ठेवले आहे.

जहाँगीरने तुघलकाच्या पावलावर पाऊल टाकत अलाहाबाद इथं कोसंबी या महत्त्वाच्या ठिकाणावरून एक स्तंभ आणून ठेवला. हा स्तंभ आज ‘अलाहाबाद पिलर’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. सोबतच, लौरिया नंदनगढ इथल्या स्तंभावर जहाँगीरचा वंशज औरंगजेबानं आपलं नाव कोरलं असून त्यामध्ये ‘मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब पादशाह गाजी सन १०७१ (इसवी सन १६६०-६१)’ असा उल्लेख वाचायला मिळतो. सांचीचा स्तंभ सोडला, तर अशोकाचे इतर स्तंभ गंगा आणि यमुनेच्या दोआब प्रदेशात जास्त प्रमाणात आढळून येतात. सारनाथ, लौरीया, अलाहाबाद, फिरोजशाह कोटला, वैशाली आदी ठिकाणांवरील स्तंभ प्रसिद्ध आहेत. पंचवीस ते तीस फूट उंच एकाच दगडात कोरलेला स्तंभ, त्यावर गोलाकृती आडवं चक्र आणि कमळाच्या उलट्या आकाराची रचना, त्यावर हत्ती, वाघ, बैल किंवा घोडा यांसारखे प्राणी आणि त्यांच्या डोक्यावर धम्मचक्र... साधारणपणे एखाद्या स्तंभाची अशी रचना असते. यातील काही स्तंभशीर्ष, ज्याला आपण पिलर कॅपिटल म्हणतो, ते जगप्रसिद्ध आहेत. सारनाथ येथील चार सिंह आणि त्यावर असणारे चक्र हे १९४७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘राष्ट्रीय चिन्ह’ म्हणून स्वीकारलं.

रामपूर्वा येथील बैल आज राष्ट्रपतीच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. लौरीया नंदनगढ येथील स्तंभ आणि त्यावर असणारे सिंह अतिशय सुंदर आहेत. वैशाली येथेही अशाप्रकारचे सिंह, बैल सापडले आहेत. संकिशा येथे स्तंभावर हत्ती दिसून येतो. हे सर्व एकाच दगडात खोदलेले आहेत. टोप्रा येथे फिरोजशाह तुघलकच्या काळात स्तंभ खोदत असताना पायामध्ये एक आयताकृती तळखडा आढळून आला होता, ज्यावर संपूर्ण स्तंभ उभा होता. वैशाली इथल्या स्तंभाचं उत्खनन केलं असता, जमिनीमधील त्याची खोली ही जवळपास तीन मीटर एवढी असल्याचं नोंदवून ठेवलंय. तसेच, वैशाली येथील स्तंभाचा तळखडा चौकोनी असून, इतर कोणत्याही ठिकाणी आपल्याला चौकोनी रचना खांबाच्या पायामध्ये केल्याचं दिसून येत नाही.

अशोकानं काही स्तंभांवर आपले लेख कोरून ठेवले आहेत, तर काही स्तंभांवर लेख दिसून येत नाहीत. अभ्यासकांच्या मते, काही स्तंभ हे अशोकपूर्व काळातील असावेत. कारण, अशोकाला असे स्तंभ उभा करण्याची कल्पना अचानक कशी सुचली असेल? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो. व्ही. ए. स्मिथ यांनी पहिल्यांदा अशोकाच्या स्तंभाची कालानुक्रमानं मांडणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी असे निरीक्षण नोंदवून ठेवले आहे, की अशोकानं ग्रीक स्थापत्यातून ही प्रेरणा घेतली असावी.

पुढं, जेम्स फर्ग्युसन यांनी अशोकाच्या स्तंभ उभारणीमागं पर्शियन स्थापत्याचा प्रभाव असल्याची मांडणी केली. पण, ए. के. कुमारस्वामी हे पहिले अभ्यासक होते, ज्यांनी अशोकाच्या स्तंभाच्या उभारणीचे पूर्ण श्रेय हे एतद्देशीय स्थापत्यशास्त्राला देऊ केले. आजही अशोकाच्या स्तंभावर वेगवेगळ्या परिक्षेपातून अभ्यासक संशोधन करत आहेत. काही स्तंभाची रचना ही बौद्ध विहारांच्या किंवा स्तूपाच्या परिसरात करण्यात आल्यामुळं इर्विनसारखे अभ्यासक या स्तंभाची पूजाअर्चा होत असल्याचा अंदाज मांडतात. फू हीआनने त्याच्या प्रवासवर्णनात अशाप्रकारचं निरीक्षण नोंदवून ठेवलेले आहेच. मध्ययुगीन कालखंडात ओडिशामध्ये भास्करेश्वर मंदिराची उभारणी करण्यात आली.

भुवनेश्वर शहरातील सर्वांत उंच शिवलिंग म्हणून याला मान्यता आहे. या लिंगाची लांबी जवळपास तीन मीटर आहे. येथून जवळच अशोकाच्या एका स्तंभाचा अवशेष आढळून आहे. याच दगडापासून भास्करेश्वर मंदिरातील शिवलिंगाची निर्मिती केली असल्याचा अंदाज अभ्यासकांचा आहे. अशोकाचे हे स्तंभ आणि त्याच्या शीर्षावर कोरण्यात आलेले प्राणी, हे एवढे सुंदर आणि वास्तवाच्या जवळ जाणारे आहेत, की आपल्याला आजच्या काळात त्याची प्रतिकृती करणंसुद्धा शक्य नाही. या स्तंभाच्या आणि त्यावर कोरलेल्या लेखाच्या माध्यमातून अशोकाची भू-राजकीय व्याप्ती आणि धार्मिक तसेच सामाजिक संरचनेचा अंदाज सहजपणे लागतो.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती, तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हेदेखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

राजवंश भारती : गुप्त वंश

सकाळ वृत्तसेवा

Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjainesakal

लेखक : ॲड. सुशील अत्रे

भारताच्या अभिजात कालखंडातील- ‘क्लासिकल एज’मधील सर्वांत श्रेष्ठ, महत्त्वाचा राजवंश म्हणजे गुप्त वंश. गुप्त राजवटीला भारताचा ‘सुवर्ण कालखंड’ म्हणतात. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील अनेक महत्त्वाचे आविष्कार या काळातले आहेत. काही पुराणांची रचना, अभिजात संस्कृत महाकाव्ये, नाटके, धर्मग्रंथ, शास्त्रग्रंथ, शिल्पे, शिलालेख, मूर्ती, लेण्या, भित्तिचित्रे, अद्वितीय सुवर्णमुद्रा... अशा अनेक गोष्टी गुप्तांच्याच राजवटीत उदयाला आल्या.

राजकीय पटलावरही तत्कालीन आक्रमक असलेले शक, कुशाण, हूण हे सर्व गुप्त साम्राज्यापुढे दबून होते. सुमारे ३५ लाख चौरस किलोमीटरएवढा प्रचंड मोठा भूप्रदेश त्यांच्या अधिपत्याखाली होता! (saptarang latest article on Rajvansh Bharti Gupta dynasty)

‘आयुका’ पुणे या संस्थेतील आर्यभट्टाचा पुतळा.

‘आयुका’ पुणे या संस्थेतील आर्यभट्टाचा पुतळा. esakal

सातवाहनांची सत्ता संपुष्टात आली, तशी शक क्षत्रपांनी पुन्हा उचल खाल्ली, हे आपण आधीच्या भागात पाहिले. या परिस्थितीत पुन्हा एकदा मगध प्रांत मदतीला आला. श्रीगुप्त नावाचा मगधातील एक छोटासा सरदार सातवाहनांचा अंकित होता. त्याने आपले स्वतंत्र राज्य घोषित केले. त्याच्या नावावरून वंशाला ‘गुप्त वंश’ नाव मिळाले.

ही घटना अंदाजे इ. स. २४० मधील आहे, त्याचा मुलगा घटोत्कच. इथपर्यंत गुप्त शासन मगधात छोट्याशा प्रदेशापुरते मर्यादित होते. घटोत्कच राजाचा मुलगा चंद्रगुप्त पहिला याने लिच्छवी राजकुमारी ‘कुमारदेवी’ हिच्याशी विवाह केला आणि त्यामुळे त्याचे राज्य बरेच विस्तारले.

सामर्थ्यशाली समुद्रगुप्त

पहिल्या चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त गादीवर आला (इ. स. ३३५). याच्याच कारकीर्दीत गुप्त वंश हळूहळू शिखराकडे जाऊ लागला. भारतात ‘सुवर्णयुग’ सुरू झाले, ते समुद्रगुप्तामुळेच. चारही दिशांना पराक्रम गाजवून शक, कुशाणांना त्याने आपले मांडलिक बनविले.

दक्षिणपथातील म्हणजे आजच्या दक्षिण भारतातील अनेक राजांनाही त्याने युद्धात जिंकले. आपल्या ४५ वर्षांच्या कारकीर्दीत जवळपास २० राज्ये त्याने जिंकली आणि गुप्त साम्राज्याला जोडली. त्याने अश्वमेध यज्ञही केला होता. त्याच्या या विजयाची प्रशस्ती कौशांबी येथील अशोक स्तंभावर त्याने कोरून घेतली आहे. हा स्तंभ पुढे मुघल राजवटीत कौशांबीहून प्रयागराज (अलाहाबाद) किल्ल्यात हलविला गेला.

इतिहास संशोधकांमध्ये एक वर्ग असा आहे, ज्यांचा दावा आहे, की ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिस याने ‘सँड्राकोटस्’ या नावाने ज्याचा उल्लेख केला आहे, तो समुद्रगुप्तच असला पाहिजे, चंद्रगुप्त मौर्य नव्हे. त्यांच्या मते गुप्त राजवट खरे तर इ. स. पूर्व ३२७ ते इ. स. पूर्व ८२ अशी होती. जेव्हा, की हीच राजवट बहुतेक इतिहासकार इ. स. २४० ते इ. स. ५५० अशी मानतात.  (latest marathi news)

Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjain

चंद्रगुप्त विक्रमादित्य

गुप्तांनी समृद्धीचा कळस गाठला, तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीत- इ. स. ३७५ ते ४१५ या काळात. एक मत असे, की समुद्रगुप्ताने आपला उत्तराधिकारी म्हणून थोरला मुलगा रामगुप्त याच्याऐवजी धाकट्या चंद्रगुप्ताला नेमले. दुसरे मत असे, की रामगुप्त गादीवर आला होता; पण शक/कुशाणांपुढे त्याने लोटांगण घातले.

हा देशद्रोह पाहून चंद्रगुप्ताने त्याची हत्या केली आणि लोकांनी चंद्रगुप्ताला राजा निवडले. कसेही असो, ही निवड त्याने अक्षरश: सार्थ ठरवली. बापाच्या दहा पावले पुढे राहून त्याने गुप्त साम्राज्य वैभव शिखरावर नेले. शकांची त्याने इतकी धूळधाण उडवली, की त्याला ‘शकारी’ ही पदवी मिळाली.

त्याने ‘विक्रम संवत्’ ही कालगणना सुरू केली, अशी धारणा आहे; पण ते संवत्सर इ. स. पूर्व ५७ ला सुरू होते. मग इ. स. ३७५ मध्ये गादीवर आलेला चंद्रगुप्त ती कशी सुरू करेल? हा उलगडा होत नाही. एक मोठा निर्णय घेऊन त्याने राजधानी पाटलीपुत्राहून अवंतीनगरीला म्हणजे आजच्या उज्जैनला हलविली.

रणांगणावर शत्रूचा कर्दनकाळ असलेला चंद्रगुप्त कला, शास्त्र, धर्म या विषयांमध्ये तेवढाच जाणकार होता. त्याने ‘विक्रमादित्य’ ही उपाधी धारण केली होती. तो अनेक प्राचीन लोककथांचा नायक आहे. प्रसिद्ध नीतिकथा संग्रह, ‘वेताळ पंचविशी’ किंवा विक्रम-वेताळमधला विक्रम किंवा सिंहासन बत्तीशीमध्ये बत्तीस सोनपुतळ्या ज्याचे सिंहासन सांभाळतात, तो विक्रम राजा हाच!

कालिदास, वराहमिहीर, धन्वंतरी, वररुची आदी नऊ विद्वान ‘नवरत्ने’ म्हणून त्याच्या दरबारी होते. ‘कवी कुलगुरू’ असे ज्याला म्हणतात, तो कालिदास आणि त्याची अजरामर महाकाव्ये सगळ्यांना माहिती आहेत. ती त्याने याच काळात लिहिली. याशिवाय, विख्यात गणिती आर्यभट्ट ज्याने ‘शून्या’चा आणि दशमान स्थानकांचा शोध लावला, ज्याने ‘पाय्’ या गणिती स्थिरांकाचे संख्यामूल्य काढले, ज्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा दावा सर्वप्रथम केला, तो आर्यभट्टही चंद्रगुप्ताच्याच काळात होता.  (latest marathi news)

Gupta Dashavatar Temple at Devgad (Uttar Pradesh) & Colossal Statue of Emperor Vikramaditya at Ujjain

विश्वप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाची स्थापनाही याच काळात त्याच्या मुलाने कुमारगुप्ताने केली. वात्स्यायनाचे ‘कामशास्त्र’ आणि विष्णुशर्म्याचे ‘पंचतंत्र’ हे अजरामर ग्रंथ याच काळात लिहिले गेले. आणखी एक मोठे सामाजिक स्थित्यंतर या काळात झाले. देवता पूजनासाठी ‘यज्ञ’ करणे, ही प्राचीन पद्धत हळूहळू मागे पडून देवता या मूर्तीरूपात साकार झाल्या आणि यज्ञस्थळाऐवजी देवाचा कायमस्वरूपी निवास म्हणून ‘मंदिर’ ही संकल्पना रुजली.

उत्तर प्रदेशात देवगड येथील ‘दशावतार मंदिर’ हे अशा प्रकारच्या अगदी पहिल्या पिढीच्या मंदिरांपैकी एक आहे. दिल्लीला कुतुबमिनार परिसरात असलेला प्रसिद्ध लोहस्तंभ हाही मुळात चंद्रगुप्तानेच उभारलेला आहे. धातूशास्त्रातील चमत्कार म्हणून तो ओळखला जातो.

गेली १६ शतके तो लोखंडी स्तंभ पाऊस, पाणी, ऊन खात उभा आहे; पण जराही गंजलेला नाही. त्या लोहात कसले मिश्रण तेव्हा केले, हे त्यांनाच माहिती! प्रसिद्ध चिनी प्रवासी ‘फा हेन’ हा इ. स. ४०५ च्या सुमारास चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला होता. तेव्हाच्या वैभवाचे, सुबत्तेचे वर्णन त्याने करून ठेवले आहे.

अशा प्रकारची सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक प्रगती होण्यासाठी आधी राजकीय स्थैर्य आणि शांतता असावी लागते. ती चंद्रगुप्ताच्या कारकीर्दीत होती. राजकीय दूरदृष्टी ठेवून त्याने आपली कन्या प्रभावती गुप्ता हिचा विवाह वाकाटक घराण्यातील रुद्रसेनाशी करून दिला. शिवाय, राष्ट्रकुटांशी राजनैतिक मैत्री ठेवली. त्यामुळे तत्कालीन राजकीय आघाडीवर चंद्रगुप्त यशस्वी ठरला. तो खऱ्या अर्थाने ‘सम्राट विक्रमादित्य’ होता ! 

(क्रमशः)

सम्राट अशोकाच्या काळातली लेणी

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

भारतात तयार करण्यात आलेल्या आणि अजूनही सुस्थितीत असलेल्या सर्वांत पहिल्या धार्मिक वास्तू आजच्या बिहार राज्यात आपल्याला पाहायला मिळतात. देशाच्या राजकीय तसेच धार्मिक इतिहासातील अतिशय महत्त्वाची व्यक्ती म्हणून सम्राट अशोक संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. ‘देवानाम पिय पियदस्सी असोक’ म्हणजे देवांनाही प्रिय, प्रियदर्शी अशोक भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व संशोधकांच्या केंद्रस्थानी राहिलेला आहे.

अशोकाचे शिलालेख, बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यानं केलेलं कार्य, त्यानं उभारलेले स्तंभ, त्याचे महत्त्वाकांक्षी विजय आणि भारताचा बदललेला भू-राजकीय इतिहास आजही संशोधक, अभ्यासकांना भुरळ घालतो. अशोकाच्या शिलालेखांनी इतिहास संशोधनाचा चेहरा-मोहराच बदलून टाकला. धम्म प्रसारासाठी उभारलेले स्तूप, खोदलेल्या लेणी यांच्यामुळं धार्मिक वास्तूंच्या निर्मितीप्रक्रियेत प्रचंड मोठी उलथापालथ केली.

सम्राट अशोक खऱ्या अर्थानं इतिहासाला कलाटणी देणारा राजा म्हणून अभ्यासला गेला. पण इथं थोडी मजा आहे. अशोकानं बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी केलेलं कार्य प्रचंड मोठं आहे. परंतु, अशोकाच्या राजवटीत खोदण्यात आलेल्या चार लेणी मात्र बौद्ध धर्मासाठी नव्हत्या.

किंबहुना, स्थापत्यकीय परिमाणांच्या आधारावर आणि शिलालेखांमधून उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलंय, की अशोकाच्या काळात, भारतात सर्वांत पहिल्यांदा ज्या लेणी खोदण्यात आल्या त्या एका वेगळ्याच संप्रदायासाठी होत्या.

बिहार राज्यात गयापासून अवघ्या २४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या संपूर्ण ग्रॅनाइट पासून तयार झालेल्या बाराबर आणि नागार्जुनी नावाच्या दोन टेकड्या आहेत. दोन्ही टेकड्यांवर मिळून इथं सात लेणी खोदण्यात आल्या. यापैकी, बाराबर टेकडीवर चार तर नागार्जुनीवर तीन लेणी आहेत. यांचा कालखंड तब्बल दोन हजार तीनशे वर्षांपर्यंत मागं जातो.

बाराबर समूहातील लेणींची निर्मिती सम्राट अशोकाच्या काळात तर नागार्जुनीवरील लेणी अशोकाच्या नातवाच्या, दशरथाच्या काळात झाली. बाराबर टेकड्यांवरील लेणींची नावं अनुक्रमे लोमस ऋषी, सुदामा, कर्ण चौपार आणि विश्वमित्र आहेत. तर, नागार्जुनी टेकडीवरील लेणींची नावं गोपिका, वापी आणि वदतिका अशी आहेत.

ही लेणी अशोकानं ज्या संप्रदायासाठी खोदल्या, तो म्हणजे आजीविक. आजीविक संप्रदाय हा नियतीला मानणारा संप्रदाय होता. अभ्यासकांच्या मते, आजीविक नास्तिक होते. याविषयी मतमतांतरं आहेत. कारण बौद्ध आणि जैन साधनांमधून आपल्याला आजीविक संप्रदायाची माहिती समजते. मख्खली गोशालान यानं या संप्रदायाची स्थापना केली.

गौतम बुद्ध आणि भगवान महावीरांच्या समकालीन असणारा ही व्यक्ती आणि संप्रदाय. आपल्या नियतीमध्ये जे लिहिलं आहे, ते तसंच घडणार आहे. तुमच्या धार्मिक किंवा सांस्कृतिक उपासनेमुळं तुमच्या नशिबात लिहिलेली गोष्ट तुम्ही बदलू शकत नाहीत. नियती सर्वोच्च आहे. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून तुमची सुटका होऊ शकत नाही. या प्रकारच्या तत्त्वज्ञानाचं समर्थन करणारा हा संप्रदाय इ.स.पू. पाचव्या शतकात वगैरे अस्तित्वात आला.

विशेष म्हणजे, भारतात बौद्ध आणि जैन धर्म लोकप्रिय होत असताना सुद्धा जवळजवळ दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळ हा संप्रदाय आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून होता. बाराबर टेकड्यांवर खोदलेल्या चार लेणी याच संप्रदायाला समर्पित केल्याचं आपल्याला अशोकाच्या शिलालेखावरून समजतं. लोमस ऋषी लेणीमध्ये अशोकाचा शिलालेख नाही.

पण, बाजूलाच असलेल्या सुदामा आणि कर्ण चौपार या लेणींमध्ये अशोकाचे शिलालेख आहेत. जे अनुक्रमे त्याच्या राज्यरोहण वर्षाच्या १२ व्या आणि १९ व्या वर्षी खोदलेले आहेत. सुदामा लेणीमधील शिलालेखात अशोकाचा उल्लेख प्रियदर्शी म्हणून तर आजीविक संप्रदायासाठी निर्माण केलेल्या वास्तूचा उल्लेख कुभा या शब्दात आलेला आहे.

लेणीसाठी इथे कुभा हा शब्द वापरला आहे, हे विशेष. या शिलालेखावरून लेणीचा निश्चित काळ हा इ.स.पू. २५७ सांगता येतो. हा शिलालेख ब्राह्मी लिपीमध्ये आहे. तसेच, कर्ण चौपार लेणीमध्ये असलेल्या शिलालेखातून या लेणीचं मूळ नाव सुप्रियेक्षा असल्याचे समजते. तसंच, ही लेणी ज्या डोंगरावर खोदली, त्याचं नाव खलतिक असल्याचंही समजून येतं. सध्या हा डोंगर बाराबर नावानं सर्वसामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. तसंच, या लेणींचं मूळ नाव मागं पडून त्याजागी महाभारतातील काही प्रसिद्ध व्यक्तिरेखांच्या नावानं लोकप्रिय झालं आहे.

या लेणी ग्रॅनाइट मध्ये खोदण्यात आल्या. यांचं वैशिष्ट्य म्हणजे आतील बाजूनं पॉलिश केलेल्या भिंती. आजही आरशाप्रमाणं चमक असणाऱ्या या भिंती एवढ्या गुळगुळीत आहेत, की दोन हजार तीनशे वर्षांपूर्वी हे काम कसं केलं असावं, हा प्रश्न पडतो. लांबलचक, आयताकृती असणाऱ्या आणि अंडाकृती छत अशा स्वरूपात या लेणींचं स्थापत्य आहे.

लोमस ऋषी लेणीच्या प्रवेशद्वारावर हत्तींची मालिका आणि छोट्या स्तूपांची रचना केली आहे. स्तूप किंवा लेणीच्या प्रवेशद्वारावर अशाप्रकारची चैत्य कमान आपल्याला पाहायला मिळते, त्याची ही सुरुवात. बाजूलाच असणाऱ्या नागर्जुनी लेणींमध्ये अशोकाचा नातू दशरथाचे शिलालेख आहेत. या लेखांवरून लेणींचा काळ ठरवता येतो.

पुढं ही लयन स्थापत्याची चळवळ दक्षिणेत उतरली आणि प्रचंड लोकप्रिय झाली. पण, पाचव्या-सहाव्या शतकात दख्खन किंवा सबंध भारतात बांधीव मंदिरांची उभारणी मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाल्यामुळं हळूहळू लेणी स्थापत्याची रचना मागं पडू लागली आणि बाराव्या शतकाच्या अखेरीस ती पूर्णपणे लोकांच्या धार्मिक बांधकामातून बाजूला पडली.

अशोक हा सर्वार्थानं सम्राट म्हणूनच या भारत भूमीवर वावरला. त्यानं कोरलेले शिलालेख, स्तंभ, स्तूप, लेणी या सर्व गोष्टींमुळं भारतात धार्मिक स्थापत्यामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली. त्याचा दूरगामी परिणाम आपल्याला कित्येक शतकं दिसतो. या सर्व क्रांतीची जिथून सुरुवात झाली, त्या बिहारमधील सात टेकड्या, ज्यांना एकत्रितपणे सातघरव असे म्हणतात, त्यांची ही थोडक्यात ओळख.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

राजवंश भारती : सातवाहन‌ वंश

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

एक जनमान्य समज विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला. याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.

म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद! (saptarang marathi article on Satavahana dynasty news)

महाभारत काळ किंवा त्याही आधीपासून ज्या केंद्रीय मुख्य सत्ता भारतात होत्या, त्या बहुतांश उत्तरेकडे किंवा वायव्य आणि ईशान्य भारतात होत्या, असं दिसतं. यापैकी बराच मोठा कालखंड तर मगध सत्तेचा होता, म्हणजे ‘पाटलीपुत्र’ ही राजधानी. दक्षिणेत असलेली राज्ये ही बहुधा मांडलिक किंवा अंकित राज्ये होती.

शुंग वंशाचे पतन होईपर्यंत हीच परिस्थिती होती. शेवटचा शुंग राजा देवभूती याची हत्या करून वासुदेव काण्व राजा झाला. पण, काण्व वंशाचे केवळ चार राजे झाले. एकूण फक्त ४५ वर्षे त्यांची सत्ता होती. अशी धारणा आहे, की चौथा काण्व राजा सुशर्मा याला ‘सिमुक सातवाहन’ याने मारले (की केवळ पदच्युत केले?) आणि सत्ता ताब्यात घेतली.

या सत्तांतराविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध नसली, तरी सातवाहन वंश हा काण्वांनंतर लगेच सत्तेवर आला, हे नक्की. युरोपिअन इतिहासकार मानतात, की सातवाहनांची सत्ता इ. स. पूर्व सुमारे पहिले शतक (अखेर) ते इ. स. तिसरे शतक, अशी अंदाजे २९० वर्षे होती.

मात्र, भारतीय पुराणांमधील नोंदी वेगळे सांगतात. वायू पुराण, मत्स्य पुराण आणि विष्णू पुराण आदी प्राचीन ग्रंथांमध्ये सातवाहन वंशाचा उल्लेख ‘आन्ध्र’ अथवा ‘आन्ध्रभृत्य’ असा येतो. पुराणांतील उल्लेखानुसार सुमारे ४६० वर्षे या वंशाची सत्ता होती आणि या वंशाचे एकूण ३० राजे होऊन गेले. त्यांची यादी वरील पुराणांमध्ये दिलेली आहे.   (latest marathi news)

Stone Ranjan of Zakati at Naneghat & Sculpture of Satavahana period.

सातवाहनांचा संस्थापक ‘सिमुक’ होता, यावर मात्र एकमत आहे. हा ‘श्रीमुख’चा अपभ्रंश वाटतो. याच नावाचा उल्लेख कधी शिशुक, तर कधी सिंधुक असाही येतो. ‘सातवाहन’ हे वंशनाम कशावरून रूढ झाले, यावरही मतांतरे आहेत. या नावाचा त्यांचा एक पूर्वज होता, हे एक मत आहे; तर या वंशातील राजे सूर्यवंशाशी नाते सांगत असल्याने सात (घोड्यांचे) वाहन- रथ असलेला आराध्य देव सूर्य; म्हणून सातवाहन हे नाव त्यांनी घेतले, हेही मत आहे.

यालाच जवळ जाणारे ‘सातकर्णी’ हे नाव एका राजाने घेतले आणि पुढे तेच नाव ‘बिरूद’ म्हणून इतर वंशजांनीही लावले. आंध्र या पर्यायी नावाबद्दल असं म्हणतात, की हे नाव नंतर रूढ झाले, कारण महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात त्यांची सत्ता पसरली. याउलट, सध्याच्या तेलंगणातील धरणीकोटा अथवा अमरावती ही सातवाहनांची आधी राजधानी होती, असेही मत आहे. नंतर ती प्रतिष्ठान (आताचे पैठण) येथे आणली. मात्र, सातवाहन वंश कीर्ती शिखरावर असताना त्यांची राजधानी प्रतिष्ठानलाच होती. सातवाहनचे आणखी एक पर्यायनाम ‘शालिवाहन’ असेही आहे.

आंध्र वंशाची एक महत्त्वाची गोष्ट अशी, की त्यांच्या रूपाने अनेक शतकांमध्ये पहिल्यांदाच भारताचे सत्ताकेंद्र दक्षिणेत आले. दुसरी-आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातवाहनांनी ‘महाराष्ट्र’ आकाराला आणला. ते महाराष्ट्राचे पहिले राजघराणे आहे.

त्यांच्याच काळात संस्कृतपासून वेगळी अशी ‘प्राकृत’ भाषा उदयाला आली; जिचा एक आविष्कार ‘महाराष्ट्री’ भाषा हा आहे, तीच पुढे प्रगल्भ होऊन ‘मराठी’ भाषा झाली. त्यामुळे ‘महाराष्ट्रा’चा असा स्वतंत्र राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास सातवाहनांपासून सुरू होतो.

जुन्नरजवळ नाणेघाट आहे. या नाणेघाटातून एके काळी व्यापारी वर्दळ चालायची. याच घाटमाथ्यावर एक भला मोठा दगडी रांजण आहे. तो सातवाहन काळात, जकात गोळा करण्यासाठी ठेवला होता, असे म्हणतात. ही जकात ‘कार्षापण’ या नाण्यांच्या चलनात असे.

इथेच जवळ दगडी शिळेवरती राणी नागनिकेच्या दानधर्माबद्दल मोठा शिलालेख आहे.
पहिला सातवाहन राजा सिमुक याच्यापासूनच त्यांचे एक मुख्य ध्येय होते; ते म्हणजे शकांचा नि:पात! शक अथवा सीथिअन्स ही प्राचीन इराणी वंशाची एक आक्रमक जमात होती. त्यांनी ग्रीकांच्या पाठोपाठ भारतावर अनेक हल्ले केले.

तोवर दुबळी झालेली मगध राजसत्ता शकांपुढे हतबल होती. सातवाहन राजांनी शकांना आपला शत्रू क्रमांक एक मानले आणि त्यांच्या अनेक पिढ्या शकांशी लढल्या. शकांच्या टोळीप्रमुखाला राजा अथवा महाराज हे संबोधन नसून, ‘क्षत्रप’ हे नाव होते. असे अनेक क्षत्रप तेव्हा भारतात ठिकठिकाणी आक्रमणे करीत होते. काही प्रदेश त्यांच्या ताब्यात गेलाही होता; पण त्यांना प्रतिकारही तेवढाच जबरदस्त होत होता.   (latest marathi news)

गौतमीपुत्र सातकर्णी

सातवाहन वंशाच्या ३० राजांची यादी उपलब्ध असली, तरी त्यांच्यापैकी सर्वांत कर्तृत्ववान आणि श्रेष्ठ राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. सातकर्णी हे तर आधीपासूनच उपनाम म्हणून वापरलेले आहे. आणि हा वंश मातृसत्ताक असावा, असे दिसते. राजाच्या आईचे नाव ‘गौतमी बलश्री’. त्यामुळे तो स्वत: ‘गौतमीपुत्र!’ आंध्र राजांच्या विविध याद्यांचा समन्वय केला, तर गौतमीपुत्र हा सिमुकापासून २३ वा राजा ठरतो.

‘अप्रतिहतचक्र’ अशी त्याची उपाधी होती. त्याचा शासनकाळ कोणता, यावर अनेक मतांतरे आहेत. पण, इ. स. ६०/७० ते ८५/९५ या दरम्यान केव्हा तरी तो असावा. एक जनमान्य समज- विशेषत: दक्षिण भारतात असा आहे, की शालिवाहन हे गौतमीपुत्राचेच एक प्रचलित नाव होते; आणि त्याने इ. स. ७८ मध्ये नाशिकजवळ गोवर्धन येथे बलाढ्य शक क्षत्रप ‘नहपान’ याचा समूळ नाश केला आणि याच विजयाच्या स्मरणार्थ तेव्हापासून ‘शालिवाहन शके’ ही कालगणना सुरू झाली.

म्हणून शक वर्ष आणि इसवी सन यांत ७८ वर्षांचे अंतर असते. हा सिद्धांत काही संशोधकांना मान्य नाही. शक ही कालगणना शक क्षत्रपानेच अथवा कुशाण राजा कनिष्काने सुरू केली, असे त्यांचे म्हणणे आहे. ही मतांतरे बाजूला ठेवली तरी गौतमीपुत्र सातकर्णीची कारकीर्द ही सातवाहन वंशाचा सुवर्णकाळ होता, कीर्तीचे शिखर होते हे निर्विवाद!

सिमुकाचा मुलगा सिरी सातकर्णी याची पत्नी नागनिका हिचा उल्लेख आपण नागवंश पाहतानाच केला आहे. ती स्वत: राज्यकर्ती होती. तिच्या नावाची नाणी आहेत. या राजांपैकी सात-आठव्या राजाचे नाव ‘हाल सातवाहन’. याची ओळख रणांगणामुळे नाही, तर एका ग्रंथामुळे आहे. ‘गाथा सप्तशती’ किंवा तत्कालीन भाषेत ‘गाहा सत्तसई’ हा प्राकृत मराठीतील ग्रंथ त्याने संपादित केला आहे. याशिवाय, कवी गुणाढ्याने रचलेला ‘कथासरित्सागर’ किंवा ‘बृहद्कथा’ हा ‘पैशाची’ भाषेतील ग्रंथही सातवाहन काळातलाच आहे.

गौतमीपुत्राएवढा नसला, तरी बराच कर्तबगार असलेला अखेरचा राजा होता यज्ञश्री सातकर्णी. त्याच्यानंतर सातवाहन वंशाला उतरती कळा लागली. अखेरचा राजा पुलुमवी- चौथा, मृत्यू पावला, तेव्हा सातवाहन राज्याची शकले झाली आणि दबलेल्या शक क्षत्रपांनी ठिकठिकाणी पुन्हा उठाव करून जुने प्रदेश बळकावले.

पांडव लेणी : ऐतिहासिक वारसा

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी

महाराष्ट्रातील महत्त्वाचं धार्मिक स्थळ म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जातो. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी... त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत, ज्ञानदेवादी भावंडांचं वास्तव्य... यामुळं हा भाग कायम धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रासाठी केंद्रबिंदू ठरला आहे.

महाराष्ट्रातील सर्वांत जास्त गडांची संख्या याच जिल्ह्यामध्ये असल्यामुळं भटक्यांची पंढरी म्हणूनही हा जिल्हा भ्रमंती करणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. मिसळ, चिवडा, द्राक्षं यांसारख्या खाद्यपदार्थांमुळं हा जिल्हा खवय्यांना सुद्धा आपल्याकडं आकर्षित करतो.

नाशिक धार्मिक, राजकीय, ऐतिहासिक आणि निसर्गानं संपन्न असा जिल्हा आहे. याच नाशिकपासून जवळ असलेला एक लेणीसमूह तितकाच महत्त्वाचा आहे. पांडव लेणी या नावानं मागील शंभर-दीडशे वर्षांपासून स्थानिकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या लेणी समूहाचं खरं नाव त्रिरश्मी लेणी.

सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रपांच्या अस्तित्वानं या लेणी समूहाला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. डोंगरावर खोदलेल्या या २३ लेणींची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात सुरू झाली आणि इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत सुरू होती. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचं केंद्र म्हणून हा भाग उदयास आला.

व्यापारी तसेच बौद्ध भिक्खूंची रेलचेल वाढली. इथं चैत्यगृह आहे, विहार आहे. ज्या ठिकाणी स्तूपाची रचना करण्यात येते आणि उपासनेसारखे विधी पार पाडले जातात, त्याला चैत्यगृह म्हणतात. तर ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू किंवा येणाऱ्या वाटसरू/व्यापाऱ्यांची राहण्याची व्यवस्था असते त्या लेणीला विहार या नावानं संबोधलं जातं.

ही ढोबळ व्याख्या झाली. पण, त्रिरश्मी लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं विहारात केलेली स्तूपाची रचना. ही रचना लेणी स्थापत्यामधील विकासाचे टप्पे समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात खोदण्यात आलेल्या सर्वांत पहिल्या लेणींपैकी एक म्हणजे भाजे लेणी. त्यानंतर पितळखोरा,

कोंढाणे, कोंडीवटे, ठाणाळे, कान्हेरी येथील काही लेणी. बेडसे, कार्ले या लेणी एकामागोमाग एक खोदण्यात आल्या. या लेणींचा काळ किंवा त्यांच्यावर असलेल्या धार्मिक संप्रदायाचा प्रभाव लेणींची वर्गवारी करण्यास मदत करतो. नाशिक येथील लेणी समूहावर आपल्याला हिनयान तसेच महायान संप्रदायाचा प्रभाव जाणवतो.

गौतम बुद्धांना प्रतीकात्मक स्वरूपात जो संप्रदाय पुजत असे, तो हिनयान आणि गौतम बुद्धांच्या प्रतिमांची निर्मिती ज्या संप्रदायाच्या काळात सुरू झाली, बौद्ध धर्मात प्रतिमा पूजनाची सुरुवात ज्यांनी केली तो महायान संप्रदाय.

नाशिकच्या त्रिरश्मी लेणीमध्ये या दोन्ही संप्रदायाच्या खुणा आपल्याला आढळतात. महायान काळात खोदण्यात आलेल्या महाराष्ट्रातील काही प्रमुख लेणी म्हणजे कान्हेरी, कार्ले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामागील लेणी, अजंठा.

पुढं तंत्र सिद्धांतावर आधारित वज्रयान लोकप्रिय होऊ लागला, ज्याचा प्रभाव आपल्याला वेरूळ येथील बौद्ध लेणींवर दिसून येतो. या संप्रदायाच्या अस्तित्वावरून सुद्धा लेणींची कालनिश्चिती करणं सोपं जातं.

त्रिरश्मी लेणी समूहातील तिसऱ्या क्रमांकाचं लेणं महत्त्वाचं आहे. सांची येथील तोरणद्वाराची प्रतिकृती आपल्याला या लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर खोदलेली दिसते. अशाप्रकारची रचना असलेली महाराष्ट्रातील ही एकमेव लेणी आहे. याच लेणीमध्ये सातवाहन साम्राज्ञी गौतमी बलश्री हीचा लेख कोरलेला आहे.

गौतमी बलश्री ही सातवाहन राजपरिवारातील सुप्रसिद्ध गौतमीपुत्र सातकर्णी याची आई. या लेणीची निर्मिती संघ साठी केल्याचा उल्लेख शिलालेखात कोरलेला आहे. तसेच, लेणी क्र. १० मध्ये सहा शिलालेख पश्चिमी क्षत्रपांनी कोरलेले आहेत.

लेणी क्र. ३, ११, १२, १३, १४, १५, १९ आणि २० मध्ये शिलालेख कोरलेले आहेत. हे सर्व शिलालेख ब्राह्मी लिपीत असून या शिलालेखांमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या भागावर सातत्यानं सातवाहन, पश्चिमी क्षत्रप आणि अभिर राजांमध्ये वर्चस्वासाठी संघर्ष झाल्याचे समजतं.

या राजघराण्यांच्या व्यतिरिक्त काही व्यापाऱ्यांनी सुद्धा या लेणीच्या निर्मितीसाठी आर्थिक साहाय्य दिल्याच्या नोंदी अनेक शिलालेखांमधून वाचायला मिळतात. गौतमी बलश्रीचा शिलालेख अनेकांगाने महत्त्वाचा आहे. या शिलालेखामध्ये आलेले गौतमीपुत्र सातकर्णीचे वर्णन आवर्जून वाचण्याजोगे आहे. लेखात लिहिले आहे,

“सिरी सातकणि गोतमीपुत (श्री सातकर्णी गौतमीपुत्र), ज्याची ताकद हिमवत, मेरू, मंदार पर्वतासारखी आहे. असिक, अपरान्त, असक, मूलक यांचा जो राजा आहे. विंध्य, सह्य, कन्हगिरी, सिरीतान, मलय, महेंद्र, श्वेतगिरी सारख्या पर्वतांचा स्वामी आहे.

पृथ्वीवरील सर्व राजांनी ज्याचं अधिपत्य मान्य केलं आहे. ज्याचा चेहरा सूर्याच्या प्रकाशाने उमललेल्या कमळाप्रमाणं अतिशय सुंदर आहे, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी आहे. ज्याच्या घोड्याने तिन्ही समुद्राचे पाणी प्यायले आहे (तिसमुदतोयपितवाहन). ज्याचे बाहू लांब, पिळदार आणि मोठे आहेत. ज्याने शक,

पहलव, यवनांचा नाश केला आहे आणि सातवाहन घराण्याची कीर्ती दिगंत केली आहे, अशा राजाधिराज राजाच्या आईने, संयमी, त्यागी, तपस्वी अशा गौतमी बलश्री हिने वशिष्ठीपुत्र पुळूवामीच्या १९ व्या शासनकाळात दान दिले आहे.”

दोन हजार वर्षांपूर्वी दख्खन भूभागावर राज्य करणाऱ्या बलाढ्य गौतमीपुत्र सातकर्णीचं हे वर्णन रोमांचकारी आहे. सातवाहनांचे कायम शत्रुत्व राहिलेल्या पश्चिम क्षत्रपांचा लेख याच लेणीसमूहात असणे, हीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.

लेणी क्र. ३ आणि लेणी क्र. १० या दोन्ही लेणींचा स्थापत्याच्या दृष्टिकोनातून केलेला तुलनात्मक अभ्यास, खांबाची रचना, ब्राह्मी लिपीतील शिलालेख आणि त्याआधारे उजेडात येणारा दोन हजार वर्षांपूर्वीचा राजकीय, सामाजिक आणि कला व स्थापत्यकीय महाराष्ट्राचा पसारा हे अतिशय आकर्षक आणि अचंबित करणारं आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलेल्या या त्रिरश्मी लेणीस आवर्जून भेट द्यायला हवी.

राजवंश भारती : शुंग राजवंश

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

मौर्यवंशाचा बृहद्रथ राजा म्हणून अगदीच अयशस्वी ठरला. लोकांना त्याच्या नाकर्तेपणाचा अक्षरश: तिटकारा आला होता. त्याचा पूर्वज असलेल्या चंद्रगुप्ताने ज्या तडफेने ग्रीकांना हाकलून लावले होते, ती तडफ बृहद्रथाकडे औषधालाही नव्हती. त्याचा दुबळेपणा बघून डिमिट्रियस आणि मिनॅन्डर या ग्रीक राजांनी भारतावर पुन्हा आक्रमणे सुरू केली होती.

अशा आणीबाणीच्या वेळी मौर्यांचा सेनापती पुष्यमित्राने कणखरपणाने त्यांना युद्धात मार देत देत थेट सिंधूच्या पलिकडे हाकलले. तो 'शुंग' वंशाचा होता. मगध साम्राज्याचा सम्राट म्हणून स्वत: गादीवर बसला ( इ.स. पूर्व १८५). तिथून शुंग राजवटीला सुरुवात झाली. (nashik saptarang latest article on Shunga Dynasty marathi news)

इतिहासाची नेहेमी पुनरावृत्ती होत असते.. ‘हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ’, असं जे म्हणतात; त्याची कित्येक उदाहरणे सापडतात. मौर्य साम्राज्य स्थापन करताना चंद्रगुप्ताने जे धनानंदाबाबत केले, तेच कालांतराने मौर्यवंशाच्या बृहद्रथाबाबत घडले. राजा म्हणून बृहद्रथ अगदीच अयशस्वी होता.

लोकांना त्याच्या नाकर्तेपणाचा अक्षरश: तिटकारा आला होता. त्याचा पूर्वज असलेल्या चंद्रगुप्ताने ज्या तडफेने ग्रीकांना हाकलून लावले होते, ती तडफ बृहद्रथाकडे औषधालाही नव्हती. त्याचा दुबळेपणा बघून डिमिट्रियस आणि मिनॅन्डर या ग्रीक राजांनी भारतावर पुन्हा आक्रमणे सुरू केली होती.

अयोध्या (साकेत) ग्रीकांच्या ताब्यात गेली होती. देश जाण्याची वेळ आली‌. सम्राट मात्र अहिंसेचीच माळ जपत बसला होता. अशा आणीबाणीच्या वेळी मौर्यांचा सेनापती असलेल्या पुष्यमित्राने कणखरपणाने त्यांना युद्धात मार देत देत थेट सिंधूच्या पलिकडे हाकलले.

सेनापती पुष्यमित्र हा 'शुंग' वंशाचा होता. त्याने या देशघातक राजाविरुद्ध बंड केले आणि एका सैनिकी संचलनाच्या प्रसंगी त्याची हत्या केली. त्यानंतर मगध साम्राज्याचा सम्राट म्हणून स्वत: गादीवर बसला ( इ.स. पूर्व १८५). तिथून शुंग राजवटीला सुरुवात झाली.

हे 'शुंग' नाव एकाच शिलालेखात आढळून येतं. मध्य प्रदेशातील ‘भरहुत’ इथल्या स्तूपाच्या प्रवेशदाराच्या स्तंभावर ब्राह्मी लिपीत ‘शुगानाम राजे..’ अशी अक्षरे कोरली आहेत. हा उल्लेख शुंगवंशाचा आहे. तसेच अयोध्या धनदेव शिलालेख म्हणून जो ओळखला जातो, त्या शिल्पपट्टीवरती ‘पुष्यमित्र’ हे नाव ब्राह्मी लिपीत कोरले आहे. (latest marathi news)

काही इतिहासकारांनी, शुंग राजांनी बौद्धधर्माची बांधकामे सूडबुद्धीने तोडून टाकली असे दावे केले आहेत. ते दावे निरर्थक आहेत, हा इतिहास आहे. भरहुतचा स्तूप तर शुंग राजवटीत बांधला गेलाच, परंतु सांचीच्या सुप्रसिद्ध स्तूपाभोवतीचे नक्षीदार कठडेही शुंग राजांनीच बांधले आहेत.


पुष्यमित्राने सुमारे ३६ वर्षे राज्य केले. त्याने ग्रीकांवरील विजयानंतर ‘अश्वमेध यज्ञ’ केला होता; जो एखादा चक्रवर्ती सम्राटच करतो. सुप्रसिद्ध व्याकरणकार पतंजली हा पुष्यमित्राचा समकालीन होता. त्याच्या ‘महाभाष्य’ या ग्रंथात एके ठिकाणी ‘इह पुष्यमित्रम् यजामहे ..’ असा उल्लेख आहे.

तो वर्तमानकाळात केलेला आहे- भूतकाळात नाही. याचा अर्थ पतंजली निश्चितपणे पुष्यमित्राच्या काळात होता. भारताच्या इतिहासात पुष्यमित्राची कारकीर्द लक्षणीय आहे. स्वा. सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पानां’पैकी दुसरे पान सम्राट पुष्यमित्राचे आहे!

पुष्यमित्रानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र इ.स. पूर्व १४९ मधे राजा झाला. तो सुद्धा पराक्रमी होता. मुख्य म्हणजे तो कथानायक म्हणून प्रसिद्ध आहे. कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्रम्' या नाटकाचा तो नायक आहे. या नाटकात, तेव्हा विदिशा प्रांताचा प्रांतपाल असलेला राजकुमार अग्निमित्र आणि विदर्भ राजकन्या मालविका यांची प्रेमकथा तर आहेच; पण तिच्या जोडीने तत्कालीन राजकारण सुद्धा आहे.  (latest marathi news)

Bharhut (Madhya Pradesh) Shunga carvings and pillars near the stupa.

अग्निमित्राचा मुलगा वसुमित्र याचे युद्धातील पराक्रम, विदर्भराज यज्ञसेनाचा त्याने केलेला पराभव, विदर्भ राज्याचे द्विभाजन, पुष्यमित्राचा अश्वमेध यज्ञ, यवनांशी- म्हणजे ग्रीकांशी लढाया या घटनाही नाटकात दाखवल्या आहेत. याशिवाय, नंतरच्या काळात बाणभट्टाने लिहिलेल्या 'हर्षचरितमानसात' सुद्धा सम्राट पुष्यमित्राची कहाणी आहे.

ब्राह्मण ज्ञातीतील व्यक्तीने सम्राट होणे आणि राजवंश सुरू करणे ही गोष्ट शुंग वंशाद्वारे भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडली. शुंग वंश एकूण ११२ वर्षे सत्तेवर होता. या काळात या वंशाचे पुष्यमित्र, अग्निमित्र, वसुज्येष्ठ, वसुमित्र, भद्रक, पुलिंदक, घोषवसु, वज्रमित्र, भागवत आणि देवभूती असे राजे होऊन गेले.

पण अग्निमित्रानंतरचा एकही राजा नाव घेण्याजोगा नव्हता. ओडिसा राज्यातील हाथीगुंफा इथल्या शिलालेखात नमूद केल्याप्रमाणे कलिंगराज खारवेल याने मगधाच्या 'शुंग राजाला' युद्धात पराजित केले होते. तो राजा बहुदा वसुज्येष्ठ असावा. भागवताची कारकीर्द नुसतीच दीर्घ होती. अखेरच्या देवभूतीची इ.स. पूर्व ७३ मधे त्याचा आमात्य वासुदेव काण्व याने हत्या केली आणि तेव्हापासून शुंग वंश संपून काण्व वंशाची राजवट आली.

मौर्य-कला (भाग १)

सकाळ वृत्तसेवा

- अजेय दळवी

खरं तर जग जिंकायला निघालेलं ग्रीक सैन्य, भारताच्या पूर्वेपर्यंत धडक मारून नंद वंशाचं मगध राज्य जिंकण्याची अभिलाषा बाळगून होतं. भारतात प्रवेश करताना वायव्येकडच्या छोट्या छोट्या गणराज्यांशी आणि पुरू राजाशी लढून थकल्यानंतर, जिंकलेल्या प्रदेशावर राज्यपाल नेमून ॲलेक्झांडर परत फिरला.

मगधचा नंदवंशीय राजा सामर्थ्यवान असला तरी जुलमी होता. त्या असंतोषाचा फायदा घेत चंद्रगुप्त मौर्य या शूर आणि महत्त्वाकांक्षी सरदारानं विष्णुगुप्त चाणक्यांच्या मदतीनं पंजाबमध्ये सैन्याची जमवाजमव करून लहान-मोठी राज्ये आणि ग्रीक सत्तेखालील प्रदेश जिंकला...मगधावर स्वारी करून नंद राजाची हत्या केली व पाटलीपुत्र इथं - म्हणजे सध्याचं पाटणा - मौर्य राजसत्तेची स्थापना केली.

मौर्य साम्राज्यावर मोठ्या सैन्यानिशी चढाई करणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्तानं पूर्ण पराभव केला व अशा प्रकारे प्राचीन भारताच्या इतिहासातलं हिमालयापासून म्हैसूरपर्यंत आणि कलिंगवगळता काबूल-कंदाहारपासून बंगालपर्यंत एक विस्तीर्ण असं पहिलं एकछत्री अंमल असलेलं साम्राज्य प्रस्थापित झालं.

त्यादरम्यान चंद्रगुप्ताच्या दरबारास भेट देणारा ग्रीक सत्ताधीश सेल्युकस निकेटरचा वकील (उच्चाधिकारी) मेगॅस्थेनिसलिखित ‘इंडिका’ या दस्तऐवजात चंद्रगुप्ताच्या भव्य आणि सुंदर राजवाड्याचं वर्णन आहे, तसंच इसवीसन ४०० मध्ये आलेल्या फाहियान या चिनी प्रवाशानंही ‘या प्रासादाच्या भिंती, दरवाज्यावरील कोरीव काम, तसंच शिल्पकाम मानवानं केलेलं आहे असं वाटत नाही’ असं नमूद करून ठेवलं आहे.

चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा बिंदुसार यानं २५ वर्षं शांततेत राज्य केलं. त्यानंतर आलेला त्याचा पुत्र सम्राट अशोक यांची महत्त्वपूर्ण राजवट सुरू झाली. साम्राज्य मोठं असलं तरी कलिंग देश - म्हणजे सध्याचं ओडिशा हे राज्य - मात्र स्वतंत्र होतं. तेव्हा, कलिंग देशावर स्वारी करून ते आपल्या साम्राज्याला जोडताना झालेल्या युद्धात साधारणतः एक लाख लोक मारले गेले. दीड लाखापेक्षा जास्त युद्धकैदी झाले.

त्यानंतर उद्भवलेली रोगराई आणि पडलेला दुष्काळ यांमुळे लाखो लोक मरण पावले. या मानवसंहाराचा सम्राट अशोक यांना पश्चात्ताप झाला. कलिंगयुद्ध शेवटचं ठरलं. त्यानंतर सम्राट अशोक यांनी अहिंसाप्रधान बौद्ध धर्माचा स्वीकार करत उर्वरित आयुष्य धर्मप्रसारात व्यतीत केलं.

या काळात शत्रुरहित असं एकसंध बलशाली मौर्य साम्राज्य अस्तित्वात आल्यामुळे शांतता आणि संपन्नता आली. परकीय संस्कृतीशी सलोख्याचे संबंध आल्यामुळे कलेला नवचैतन्य लाभून तिचा उत्कर्ष झाला. शांतता, एकांतवास, ध्यानधारणा, आध्यात्मिक चिंतन यासाठी ऋषी-मुनी, भिक्षू हे अनेकदा डोंगरांत नैसर्गिकपणे निर्माण झालेल्या गुहांमध्ये राहत असत.

सम्राट अशोक यांच्या काळात डोंगराळ खडक मुद्दाम फोडून गुहा निर्माण करण्याची प्रथा सुरू झाली आणि एक खास भारतीय वास्तुकला जन्माला आली.

बिहारमध्ये असलेली लोमश/लोमस ऋषींची गुहा ही तत्कालीन लाकडी बांधणीच्या सुंदर वास्तूची हुबेहूब नक्कल असल्याचं जाणवतं.

सध्याच्या जहानाबाद जिल्ह्यात डोंगराळ भागात ही गुहा आहे. तिच्या दर्शनी भागावर अश्वनालाकृत कमान कोरलेली आहे. तिच्या आतील अर्धवर्तुळाकार पट्टीत उथळ उठावात दोन्ही बाजूंनी मध्याकडं येणाऱ्या हत्तींच्या रांगा कोरलेल्या आहेत. आतील भागात आलंकरण नसलं तरी दगडी भिंतीला दगड घासून हा भाग मौर्य पद्धतीनं आरशासारखा गुळगुळीत करण्यात आला आहे.

सम्राट अशोक यांनी सर्वसामान्य माणसाला सदाचार शिकवण्यासाठी स्तंभलेख, गुहालेख आणि गिरिलेख हे पाली भाषेत कोरून बौद्ध धर्माज्ञा पोहोचवण्याचं मोठं कार्य केलं. असेच सुमारे ३४ शिलालेख देशाच्या चारही भागांत सापडले आहेत. मौर्यकाळातल्या कलाकृती अभ्यासताना काही मोजकी शिल्पं आणि त्यातही काही अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्तंभशीर्ष उपलब्ध आहेत.

सम्राट अशोक यांनी साधारणतः चाळीस फूट उंचीचे सुमारे ३० स्तंभ राजमार्गांवर, राज्याच्या सीमेवर आणि महत्त्वाच्या धार्मिक ठिकाणी उभारले. हे स्तंभ चुनारच्या खाणीतल्या पिवळ्या वालुकाश्मात आहेत. या स्तंभांपैकी तेरा स्तंभ आजही उपलब्ध आहेत.

त्यावरील एक किंवा अनेक प्राण्यांच्या शिल्पांनी बनवलेले स्तंभशीर्ष हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जातात. सर्व स्तंभांवर अशोक यांच्या १४ आज्ञा कोरलेल्या आहेत. या स्तंभांसारखी झिलई मौर्यकाळापूर्वी आणि नंतर कोणत्याही शिल्पात आढळत नाही. यांपैकी लौरिया-नंदनगडचा सिंहस्तंभ बिहारच्या चंपारण जिल्ह्यात आज दोन हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहायला मिळतो.

बिहारमधील रामपूर इथं सापडलेलं वृषभ स्तंभशीर्ष हे वालुकाश्म दगडात एकसंध घडवलेलं आहे. आखूड शिंगं, उभारलेले कान, मोठ्या आकाराचं वशिंड...असा हा धष्टपुष्ट वृषभ आहे. मात्र, या शिल्पात बैलाच्या उन्मादाचा लवलेशही आहे. उलट, हे वृषभशिल्प पाहताना सौम्यताच अनुभवाला येते. सर जॉन मार्शल यांनी तर ‘भारतात निर्माण झालेल्या प्राचीन शिल्पांमधलं सर्वोत्कृष्ट शिल्प’ अशी या शिल्पाची प्रशंसा केली आहे.

(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)

शोध भव्य बंदराचा...

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

इसवी सन १७६१. भारतात फार मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. पानिपतच्या रणांगणावर भारतातील तत्कालीन सर्वांत प्रभावशाली राजसत्ता असलेल्या मराठ्यांमध्ये आणि अहमदशाह अब्दालीच्या सैन्यामध्ये झालेल्या युद्धात भयंकर नरसंहार घडला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारी भीषण घटना त्या दिवशी घडली होती.

उत्तर भारतात ही घटना घडत असताना दक्षिणेत मात्र वेगळ्याच क्रांतीसाठी धडपड सुरू होती. जीन बाप्टिस्ट ले जेंटिल नामक फ्रेंच व्यक्ती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन थांबला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या अतिमहत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचा भाग म्हणून ले जेंटिल भारतात आला होता. एडमंड हॅली या खगोलशास्त्रज्ञानं एक भाकीत केलं होतं.

शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या बरोबर मधोमध येणार होता आणि या घटनेमुळं सूर्य आणि पृथ्वीचं प्रमाण अंतर मोजता येण्याची संधी होती. त्यानं जगभरात जवळपास शंभरपेक्षा जास्त शास्त्रज्ञ या घटनेचं निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले. याचाच भाग म्हणून ले जेंटिल याला फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स मार्फत पुद्दुचेरीला पाठवलं.

मार्च १७६१ मध्ये तो जहाजानं निघाला. कसाबसा मे महिन्याच्या सुमारास तो भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ आला पण कॅप्टनला कळलं, की ब्रिटिशांनी पाँडिचेरी काबीज केलं आहे. निराश झालेल्या ले जेंटिलला फ्रान्सला परतावं लागलं. दुसऱ्यांदा त्यानं मिळालेल्या संधीचा वापर करण्याचं ठरवले. १७६८ मध्ये २७ मार्चला त्यांचं पाँडिचेरी इथं आगमन झाल्यावर गव्हर्नरनं त्यांचे भव्य स्वागत केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या वेधशाळेसाठी जागा निवडण्यासाठी आमंत्रित केलं.

दरम्यानच्या काळात फ्रेंचांनी पुन्हा एकदा पुद्दुचेरीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. संक्रमणाच्या आदल्या दिवशी आकाश निरभ्र होते. ले जेंटिल आणि गव्हर्नर उपग्रह पाहण्यास ठरवलेल्या जागेवर पोचले. संक्रमणाचं निरीक्षण करण्यासाठी सर्व काही अनुकूल दिसलं. पण रात्री, आकाश ढगाळलेलं पाहून ले जेंटिलला निराशा वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी, दाट ढगांनी वादळ आणलं आणि ले जेंटिलच्या दुर्बिणीचा काहीही उपयोग झाला नाही.

उदास ले जेंटिल आजारी पडला आणि यामुळं त्याच्या घरी जाण्यास विलंब झाला. याच काळात पुद्दुचेरीजवळील अरियानकुप्पम नदीकाठी एका जुन्या वस्तीचे अवशेष असल्याचं ले जेंटिलच्या लक्षात आलं. त्याला मोठ्या विटा, उद्ध्वस्त भिंती आणि जुन्या विहिरींचे अवशेष दिसले आणि त्याला खात्री पटली की हे एखाद्या मोठ्या प्राचीन गावाचे किंवा अगदी एखाद्या शहराचे अवशेष आहेत.

या गोष्टीचा त्यानं सविस्तर रिपोर्ट बनवला. त्यावर चर्चा होऊ लागली, संशोधन होऊ लागलं. पण त्या ऐतिहासिक जागेवर पहिलं संशोधनात्मक कार्य सुरू होण्यासाठी तब्बल दोनशे वर्षांचा कालावधी जावा लागला. वर्ष १९४० मध्ये फ्रेंच पुरातत्त्व अभ्यासकांनी या जागेवर उत्खनन केलं आणि त्यांना सापडलं एक अतिश्रीमंत शहर.. अरिकमेडू..!

पहिल्या शतकाच्या आसपास लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ एरिथरियन सी’ या प्राचीन ग्रंथामध्ये अरिकमेडू शहराचा उल्लेख आहे. संगम काळातील तमिळ कवितांमध्ये यवनांना परदेशी, मुख्यतः ग्रीक, रोमन आणि पश्चिम आशियाई असं ज्यांना संबोधलं गेलं, जे उत्तम दिवे, सोने आणि वाइन यांसारख्या वस्तू घेऊन आले होते. जेव्हा पहिल्यांदा या जागेवर उत्खनन करण्यात आले, तेव्हा या शहराचा जगासोबत असलेला व्यापारी संबंध आणि प्राचीन शहर म्हणून त्याचं महत्त्व अभ्यासकांनी समोर आणलं.

पुढं, अयप्पन यांनी पुरातत्त्वीय मॅपिंग आणि इतर पद्धतीनं या जागेचा संशोधकीय अहवाल तयार केला. ज्याआधारे, या जागेवर भव्य व्यापारी बंदर असल्याची माहिती उजेडात आली. सन १९४० ते १९५० दरम्यान, आणि नंतर पुन्हा सन १९८८ ते १९९२ दरम्यान, सहा हंगामांसाठी अरिकमेडूचे उत्खनन करण्यात आलं. या सर्व उत्खननामधून प्रचंड माहिती उपलब्ध झाली.

सीझरच्या काळात या प्रदेशात ग्रीक, रोमन व्यापारी आपला माल घेऊन येत असत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात वाइन, सोने, विविध मण्यांपासून तयार केलेले दागिने, काचेच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. तसेच, इथे सापडलेल्या काही खापरी भांड्यांना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे ‘अरिकमेडू टाईप १’ असं नाव देण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सुद्धा इथं वैज्ञानिक पद्धतीनं उत्खनन होत राहिलं.

रोममध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकात तयार करण्यात आलेलं मातीचं भांडं, मणी, दागदागिने, काचेचे दिवे, जेवणासाठी तयार करण्यात आलेलं भांडं अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत. यावरून इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत या जागेवर व्यापारी येत होते, विविध वस्तूंची देवाणघेवाण होत होती आणि जगासोबत भारताचे आर्थिक संबंध प्रस्थापित होते याचा अभ्यासकांना शोध लागला.

या वैभवशाली शहराची आजची परिस्थिती मात्र विचित्र आहे. पुरातत्त्व विभागानं या जागेला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. २०१२ मध्ये आलेल्या एका चक्रीवादळात या जागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच, २००४ च्या त्सुनामी दरम्यान या पुरातत्त्वीय जागेचं आधीच मोठं नुकसान झालं होतं. ले जेंटिल यानं बघितलेले पांढऱ्या मातीचे ढिगारे आता नाहीसे झाले आहेत. स्थानिक लोकांनी सन १७५५ पासून इथल्या विटांचा वापर घराचे बांधकाम करण्यासाठी केला होता. मागील तीनशे वर्षांत या जागेचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

भौगोलिक बदलामुळंसुद्धा ही जागा ओस पडली आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस बांधलेली एक पडीक वास्तू सोडली तर आता या जागेवर फारसं काही पाहण्यासारखं राहिलेलं नाही. बाजूला असलेल्या खाडीचाही वापर होत नाही. पुद्दुचेरी शहरापासून अगदी चारएक किलोमीटर वर असलेल्या या अतिमहत्त्वाच्या पुरातत्त्वीय स्थळाला भेट देणारे पर्यटक सुद्धा फार कमी आहेत.

पण विशेष गोष्ट ही आहे, की एकीकडे उत्तर भारतात लढाई सुरू असताना दक्षिणेत सूर्य आणि पृथ्वीचे अंतर शोधण्यासाठी एक मोहीम सुरू होती. त्यातच, अपघातानं या शहराचा शोध लागला. आज या ठिकाणी उपलब्ध झालेल्या महत्त्वाच्या वस्तू पुद्दुचेरी येथील संग्रहालयात पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. कधी पुद्दुचेरीला गेलात, तर या पुरातत्त्वीय स्थळाला भेट द्यायला विसरू नका.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हेदेखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

राजवंश भारती : मौर्य राजवंश

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

महाभारतानंतरच्या काळात भारतातील बहुधा सगळ्यात विशाल साम्राज्य हे मौर्य साम्राज्य होते. पाश्चात्त्य इतिहासकारांच्या दृष्टीने तर तिथंपासूनच भारताचा इतिहास सुरू होतो. त्याच्या आधीच्या काळाला ते ‘इतिहास’ मानायलाच तयार नाहीत. तो भाग जाऊ द्या; पण प्राचीन भारतातील राजवंशांमधे मौर्य वंशाची गणना अग्रक्रमाने होते, यात शंकाच नाही. इतर अनेक प्राचीन राजवंशांप्रमाणेच मौर्य वंशाबद्दलही विद्वानांमधे एकमत नाही. त्यांचा काळ नक्की कोणता, यावर आजही घनघोर वाद होत असतात. (saptarang latest article on Mauryan Dynasty news)

म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात असलेली कौटिल्याच्या अर्थशास्त्राची मूळ भूर्जप्रत

म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात असलेली कौटिल्याच्या अर्थशास्त्राची मूळ भूर्जप्रतesakal

प्रचलित मान्यता अशी आहे, की इ. स. पूर्व ३२४ मध्ये चंद्रगुप्त मौर्य सम्राट बनला. नंद वंशातील अखेरचा राजा धनानंद याचा, आर्य चाणक्याच्या मदतीने पराभव करून चंद्रगुप्त मगधाच्या गादीवर बसला. त्याच्या वंशाला ‘मौर्य’ हे नाव कसे मिळाले, यावरही विविध मते आहेत.

चंद्रगुप्त हा राजा धनानंदाचाच दासीपुत्र होता, त्याच्या आईचे नाव ‘मुरा’ असल्याने त्याने आपला वंश आईच्या नावे ‘मौर्य’ ठरवला, असे एक मत आहे. तो एका गुराख्याचा मुलगा होता आणि त्याला चाणक्याने हेरले, असे एक मत आहे. तो ‘मयूर-पोषक’ समाजात जन्मला म्हणून त्याला ‘मौर्य’ नाव मिळाले, असे जैन ग्रंथामध्ये म्हटले आहे.

यापैकी कोणत्याच दाव्याला ठोस पुरावा नाही. त्या काळातले, आज उपलब्ध असलेले ग्रंथ म्हणजे ‘कौटिलिय अर्थशास्त्र’ आणि ‘मुद्राराक्षस’ हे नाटक. यापैकी अर्थशास्त्र हा एकूणच राजधर्म विशद करणारा ग्रंथ आहे. याचा कर्ता कौटिल्य अथवा चाणक्य तथा विष्णुगुप्त हा आहे. या अद्वितीय ग्रंथाची भूर्जप्रत १९०४ मध्ये म्हैसूरच्या ग्रंथसंग्रहालयात सापडली.

मात्र या ग्रंथात चंद्रगुप्तचा स्वतंत्र उल्लेख नाही. ‘मुद्राराक्षस’ हे नाटक लिहिणारा विशाखादत्त तर खूपच नंतरच्या काळातील आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्य नक्की कोण, हे गूढ आजही कायम आहे. ग्रीक सम्राट अलेक्झांडर इ. स. पूर्व ३२७ मध्ये भारतात आला होता. तो परत गेला (भारत जिंकून वगैरे अजिबात नव्हे.) त्यानंतर चंद्रगुप्त सत्तेवर आला.

चंद्रगुप्तचा सामना ग्रीक राजा/ सेनानींपैकी सेल्युकस निकेटरशी झाला होता; ॲलेक्झांडरशी नव्हे. चंद्रगुप्ताविषयी काहीही सांगायचे, तर चाणक्याला वगळून सांगताच येणार नाही. नंद वंशाचा संपूर्ण उच्छेद करून नवख्या चंद्रगुप्तला गादीवर बसवणारा चाणक्य होता. आजच्या भाषेत तो ‘किंगमेकर’ होता. काही काळ तो मौर्य साम्राज्याचा अमात्यसुद्धा होता.

गंमत बघा, एवढे प्रचंड साम्राज्य ज्यांनी उभे केले ते दोघेही चाणक्य आणि चंद्रगुप्त आयुष्याच्या उत्तरार्धात संन्यस्त होते. चंद्रगुप्त राज्यत्याग करून दक्षिणेत श्रवणबेळगोळला गेला आणि तिथे त्याने भद्रबाहू या जैन मुनींचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर चाणक्याने काही काळ बिंदुसाराचा अमात्य म्हणून काम केले आणि नंतर वानप्रस्थ स्वीकारले. (latest marathi news)

Ashoka stambh

इ. स. पूर्व ३२४ पासून मौर्य राजवंश सुरू झाला. एक मतप्रवाह असा, की या वंशात एकूण नऊ राजे होऊन गेले. त्यांची नावे अशी अमित्रघात अथवा बिंदुसार, सम्राट अशोक, दशरथ, संप्रति, शालिशुक, देववर्मन, शतधन्वा आणि बृहद्रथ. यांची कारकीर्द इ. स. पूर्व १८४ पर्यंत होती.

त्या साली बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बृहद्रथाचा वध केला आणि स्वत:चा राज्याभिषेक केला. म्हणजे, सुमारे १४० वर्षे मौर्य वंशाची सत्ता होती. याविरुद्ध ‘कलियुगराज वृत्तांत’ या प्राचीन ग्रंथामध्ये आणि पुराणात नमूद केल्याप्रमाणे मगध राजसिंहासनावर मौर्य वंशाचे एकूण १२ सम्राट होऊन गेले.

त्यांनी एकूण ३१६ वर्षे राज्य केले आणि तो काळ इ. स. पूर्व १५३४ ते १२१८ असा होता. हा मतप्रवाह ज्यांचा आहे, त्यांनीही शेकडो संदर्भ बघून, ग्रंथ वाचून मग आपले मत दिले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांपैकी कोणालाही थिल्लरपणे ‘मूर्ख’ म्हणण्याआधी आपला अभ्यास किती, हे बघणे आवश्यक आहे.

मौर्य सम्राटांपैकी चंद्रगुप्त इतकाच; किंबहुना थोडा अधिकच प्रसिद्ध असलेला राजा म्हणजे सम्राट अशोक! चंद्रगुप्तचा नातू इ. स. पूर्व २७३ ते इ. स. पूर्व २३६ अशी त्याची कारकीर्द मानली जाते. आयुष्याच्या पूर्वार्धात अत्यंत उग्र आणि निर्मम असणारा आणि उत्तरार्धात बौद्ध धर्म स्वीकारून ज्याने हिंसेचा पूर्ण त्याग केला, तो हा अशोक. (latest marathi news)

आज भारताचे राजचिन्ह असलेला चार सिंहांकित ‘अशोक स्तंभ’ ही त्याचीच देणगी आहे. सारनाथ या ठिकाणी उत्खननात सापडलेला हा मूळ स्तंभ आजमितीस सारनाथ वस्तू संग्रहालयात ठेवलेला आहे. तो सुमारे सात फूट उंचीचा आहे. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर करण्यात मोठे योगदान अशोकाचे होते.

‘देवानाम् प्रिय .. प्रियदर्शी’ अशी त्याची पदवी होती. अशोकाबाबतही काही इतिहास अभ्यासकांचा दावा असा आहे, की प्राचीन भारतात मौर्यवंशीय अशोक आणि गुप्तवंशीय अशोक असे दोघे वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले. ज्याचे अनेक शिलालेख आपण बघतो, तो गुप्तवंशीय अशोक होता.

त्याने नंतर बौद्ध धर्म स्वीकारला. दोन्ही मतप्रवाह आपापल्या दाव्यांना दुजोरा देणारे अनेक मुद्दे मांडतात. या लेखापुरता मी अधिक प्रचलित असलेला मतप्रवाह गृहित धरून मौर्य राजवंशाची माहिती दिली आहे. परंतु एखादी पर्यायी ‘थिअरी’ कोणी मांडली असेल, तर ती न वाचताच बाजूला फेकणे मला योग्य वाटत नाही.

कारण मौर्य वंशाबद्दल कोणताही वादातीत व स्पष्ट पुरावा आज तरी उपलब्ध नाही. तेव्हा, वाचकांनी आपल्या परीने अधिक अभ्यास केला आणि आपले स्वत:चे मत बनवले, तर ती अधिक आनंदाची गोष्ट आहे.

इंग्लंडमधील वसाहत प्रेम आणि अवडंबर

अवतरण टीम

- वैभव वाळुंज

‘माझेही कित्येक भारतीय मित्र आहेत’ असं ब्रिटिश व्यक्ती म्हणत असेल, तर त्याचं अवडंबर येणारच. भारताची लोकसंख्या आणि ट्रॅफिकसारख्या उथळ गोष्टीबाबतही त्यांची काही बाष्कळ मतं असतात.

साम्राज्यवादी इतिहासाच्या मांडणीमुळे इंग्लंडच्या जनसमाजात निराळ्या तऱ्हेची वर्तणूक आणि दृष्टिकोन पाहायला मिळतो. त्यात फक्त तिथे राहणारे वसाहतीमधून आलेले लोक आणि त्यांच्या एत्तदेशीय समाजांची निराळी समज इंग्रजांनी बनवून घेतली आहे, असं दिसतं. साम्राज्याच्या काळापासून ते आजतागायत हा आपपरभाव लपवण्याचे खुजे प्रयत्न होत असले, तरी ते अनेकदा फार उघडपणे समोर येतात. खुनशी वंशद्वेष असण्यापेक्षा वसाहती देशांच्या विषयी इंग्रजांच्या मनात अवास्तव अवडंबर आणि स्तुतिस्तोम असण्याचे प्रसंग प्रामुख्याने येतात.

भारतीयांना अशा घटनांना सामोरे जावे लागते; तसेच आफ्रिकन विद्यार्थ्यांना याचा अकारण जाच होतो. मात्र सहसा त्याविषयी बोलले जात नाही. अनेकदा वसाहतवाद आणि निर्वसाहतीकरण यांचा संवाद सुरू झाल्यानंतर या गोष्टी उघडपणे बोलणं लोकांना अडचणीचं वाटतं.

या गोष्टी लपवून छपवून ‘मी रंगभेद मानतच नाही’ इथपासून ते ‘मी कुणाचाच रंग पाहत नाही’ असं बोलणं हा इथला परवलीचा वाक्प्रचार होऊन बसला आहे. ‘माझेही कित्येक भारतीय आणि आफ्रिकन मित्र-मैत्रिणी आहेत’ असं एखादी ब्रिटिश व्यक्ती म्हणत असेल, तर त्यापासून थोड्याच वेळात भारत आणि आफ्रिकेचं अवडंबर आणि स्तुतिस्तोम येणार, हे ठरलेलं.

याचं उदाहरण द्यायचं झालंच तर मला आठवते ती मॉरिटानियातील किनाऱ्याजवळ काम करणारी एक स्कॉटिश आजीबाई ट्रीश. बस न आल्याने स्कॉटलंडच्या ज्या गावी मी रात्र काढली, त्याच गावची असल्याने तिने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. तू बिफ खातोस का, हा अगदीच नित्यनेमाने विचारला जाणारा अपेक्षित प्रश्न तिने विचारला.

भारतीय बिफ खात नाहीत, हा समज असणाऱ्या लोकांपासून चार हात दूर राहायचं, हा दंडक मी नेहमी पाळतो. सहसा, ते संभाषण बाष्कळ पठडीचे पर्यटकी प्रश्न विचारण्याकडे जातं, असा माझा अनुभव आहे. भारताला ब्रिटिशांनी सुंदररीत्या जोडून ठेवलं म्हणून आज आपण अशा चमकदार ठिकाणी जाऊ शकतो, या भावनेतून भारत फिरणाऱ्यांचे इथली लोकसंख्या आणि ट्रॅफिकची परिस्थिती अशा उथळ गोष्टींसंबंधित काहीच्या काही बाष्कळ मते असतात.

म्हणूनच या संभाषणाचा पुढचा टप्पा ‘जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मी भारताची यात्रा केली होती आणि बॅगपॅकिंग करत मी अनेक ठिकाणी फिरले’ याकडे जाणार हे ठरलेलं. एकदा तर मला एका व्यक्तीने फक्त माझा चेहरा बघून दुरूनच ‘आप कैसा हाय’ असं जोरदार आरोळी ठोकत विचारलं होतं.

बरं यात तेथील गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कमी आणि आपण कसे या सर्वांपासून वाचलो आहोत, अशा पद्धतीने दुसऱ्याच्या घरात वाकून डोकावत पाहण्याचा भाव स्पष्टपणे दिसतो. भारतात चिकन टिक्का ही गोष्ट सर्व जण खातात किंवा पंजाबमधील भांगड्यात वाजवली जाणारी धून ही भारतात प्रत्येकाच्या ओळखीची असणारच, असा त्यांचा कयास असतो; तरीही वृद्धांशी अशा गोष्टी बोलणं काही प्रमाणात सुसह्य असतं, कारण ते आपली वसाहतवादी मानसिकता दडवण्याचा प्रयत्न सहसा करत नाहीत.

आजीबाईशी बोलत असताना मला याचा चांगलाच प्रत्यय आला होता. ‘जास्त काळ उन्हात राहून माझा रंगही तुझ्यासारखा झाला आहे बघ’ असं ती लडिवाळपणे बोलून हसली; तरीही आजीबाईंच्या जुन्या ठेवणीतल्या रंगभेदाचा बोचरा परिचय मला आला. नव्या इंग्रज ब्रिटिश पिढीचा रंगभेदी स्वभाव शालीत लपवत बोलण्याचा चलाख लहेजा तिच्याजवळ नव्हता. कित्येक महिन्यांनी मला शुद्ध तुपातला साजूक भिडस्त प्रामाणिक रंगभेद अनुभवाला आला.

मला तिच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं. माझा त्यावरचा अजून बोचरा प्रतिसाद गिळून पुन्हा प्रेमाने मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. याउलट नव्या पिढीतील लोकांकडे भारतात आणि भारताविषयी असणाऱ्या अनेक गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी त्यांच्या पूर्वजांकडून आलेली असली तरी त्याला ऑनलाईन सोपस्कारांचा मुलामा असतो.

‘मला भारतातील खचाखच भरलेल्या लोकलमधून प्रवास करायचा आहे’ किंवा ‘मी देवनागरी लिपीतील टॅटू गोंदवून घेतला आहे’ अशी असाधारण अवडंबरं ऐकू येतात. त्यातील बारकावे किंवा अंतर्गत लहानसहान बाबी समजावून सांगणं शक्यही नसतं आणि बरेचदा त्याची गरजही नसते. सुरुवातीच्या काळात मी अशा संभाषणांमध्ये पूर्ण परिस्थिती उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत असे.

मात्र, लवकरच माझ्या आफ्रिकन मित्रांच्या अनुभवांमधून ते करण्याची आवश्यकता किती हुशार आहे आणि हे करूनही त्याचा परिणाम होत नाही, हे अनुभवलं. विशेषतः वंशभेदाचा सामना करणाऱ्या इंग्लंडमधील स्थानिक कृष्णवर्णीय मित्रांकडून अशा संभाषणासंबंधीचे अनेकविध किस्से मला माहीत झाले.

अर्थातच आफ्रिका आणि भारत या दोघांच्या विषयी इंग्रजांच्या मनात असणाऱ्या भेदामधून फक्त नकारात्मक गोष्टी बाहेर आल्या, असे नाही तर या दोन्ही समाजांतील लोकांनी एकत्र येऊन आपल्यासारख्या दुखण्यासाठी एक कृतीपद्धती निर्माण करायचे प्रयत्नही केले. रेव्हरंड डेव्हिड हसलाम हे दक्षिण आफ्रिकेतल्या वंशभेद करणाऱ्या सरकारविरोधात चाललेल्या चळवळीचे तसेच ‘वॉर ऑन वॉन्ट’ या संस्थेचे माजी सचिव सदस्य होते.

त्यांनी इंग्लंडमध्ये दलित सॉलिडॅरिटी नेटवर्क युके अर्थात डी. एस. एन. युके या संस्थेची स्थापना केली. मजूर पक्षाचे खासदार जेरेमी कोबीन यांच्यासमवेत त्यांनी विविध कार्यकर्ते व संघटनांना एकत्र आणून जागतिक पातळीवर जातिभेद आणि जातीयतेच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणली. या संस्थेने डेन्मार्कस्थित दलित सॉलिडेरिटी नेटवर्क या २००० मध्ये स्थापन झालेल्या संस्थेसोबत काम केलं. २००७ पासून मीना वर्मा या डी. एस. एन. संस्थेचं काम पाहत होत्या.

२०२२ मध्ये गजाला शेख यांनी ही जबाबदारी घेतली. या व अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून भारतातील दलित व्यक्ती तसेच आफ्रिकेतील कृष्णवर्णीय आणि मुस्लिम समुदाय यांच्या विरोधात होणारा अन्यायाचा सामूहिक मुकाबला करण्यासाठी एकत्रित येता आलं. यातूनच जगाची राजधानी समजल्या जाणाऱ्या शहरांमधील समासाबाहेरच्या लोकांच्या जीवनाचा वेगळा अध्याय आणि त्यातून समकालीन परिस्थितीचे आकलन करण्याची दृष्टी मला समजून घेता आली.

vaiwalunj@gmail.com

(लेखक इंग्लंडमध्ये यूके सरकारच्या शिष्यवृत्तीअंतर्गत ‘नीती व धोरण’ या विषयावर संशोधन करत आहेत.)

राजवंश भारती : महाजनपदे

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

महाभारताच्या युद्धानंतरचा बराच मोठा काळ हा भारताच्या इतिहासातील ‘अंधारा कालखंड’ म्हणावा असा आहे. कोणतीही मोठी राजसत्ता, लोकोत्तर व्यक्ती या काळात झाली नाही. किमान तसा उल्लेख अगदी काव्य पुराणांमध्येही आढळत नाही. ही मधली कालदरी इतकी मोठी झाली, की त्या आधीच्या घटना काल्पनिक वाटू लागल्या.

हा अंधारा कालखंड जवळजवळ इ. स. पूर्व ६-७ व्या शतकापर्यंत राहिला. या शतकात भारतात मध्यवर्ती राजसत्तेऐवजी अनेक लहान-मोठ्या सत्ता स्थापन झाल्या. प्राचीन संदर्भानुसार मध्यम आकाराच्या वस्तीला ‘जनपद’ असे म्हणत आणि जिथे बरीच मोठी लोकवस्ती होती, त्याला ‘महा-जनपद’ हे नाव मिळाले. एक महाजनपद हे एक प्रकारे राज्यच होते. अशा सोळा महाजनपदांचा ऐतिहासिक उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. (nashik saptarang latest Marathi article rajvansh bharati on Mahajanapadas)

महाजनपदांचे वैशिष्ट्य असे, की त्यापैकी काही राजसत्ता होत्या तर काही लोकसत्ता होत्या; म्हणजे ती ‘गणराज्ये’ होती. या महाजनपदांपैकी काहींचा उल्लेख महाभारतातही आला आहे. नंतर त्यांचा उल्लेख हिंदू, बौद्ध आणि जैन वाङ्‍मयात आढळतो.

व्याकरणकार पाणिनीची ‘अष्टाध्यायी’, ‘अंगुत्तर निकाय’ हा बौद्ध ग्रंथ, तसेच ‘भगवती सूत्र’ हा जैन ग्रंथ यामध्ये महाजनपदांची यादीच दिली आहे. या वेगवेगळ्या ग्रंथांमधे असलेली महाजनपदांची यादी अगदी तंतोतंत सारखी नसली तरी काही नावे मात्र सामायिक आहेत आणि त्यांची ‘सोळा’ ही संख्यासुद्धा बहुधा सगळ्या ग्रंथांना मान्य आहे.

ही सोळा महाजनपदे अशी आहेत-

१) अंग २) मगध ३) काशी ४) कोसल ५) मल्ल ६) वृज्जी ७) चेदि ८) वत्स ९) कुरू १०) पांचाल ११) मत्स्य १२) शूरसेन १३) अश्मक १४) अवंती १५) गांधार आणि १६) कंबोज.

ही नावे अंगुत्तर निकायात आलेली आहेत. बौद्ध त्रिपिटकापैकी सुत्तपिटकात हे निकाय आहे. निकाय म्हणजे संकलन- संग्रह. पाणिनीच्या अष्टाध्यायीत काही नावे वेगळी आहेत. जसे शुद्रक, मालव, मद्र इत्यादी. भगवती सूत्रातही मलय, पांड्य अशी काही नावे वेगळी आहेत. (latest marathi news)

यापैकी अगदी प्रमुख महाजनपदे म्हणजे काशी, कोसल, गांधार आणि मगध. बौद्ध काळाच्या आधी ‘काशी’ हे सगळ्यात मोठे महाजनपद होते. बौद्ध कथांमध्ये काशीचा उल्लेख आवर्जून सापडतो. ज्यांनी जातक कथा वाचल्या आहेत, त्यांना आठवेल... ‘‘फार फार वर्षांपूर्वी काशीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता...’’अशी सुरवात बहुधा प्रत्येक जातक कथेची असते.

पुढे हेच काशी जनपद कोसलांनी ताब्यात घेतले. कंबोज व गांधार महाजनपदे ही एकेकाळी ग्रीकांच्या दृष्टीने भारताचे प्रवेशद्वार म्हणावे, अशा जागी होती, ते आजचे अफगाणिस्तान. या प्रत्येक जनपदाची स्वत:ची नाणीसुद्धा चलनात होती. ‘आहत नाणी’ अथवा ‘पंच मार्क्ड’ या स्वरूपात ती होती. अशी कित्येक नाणी संशोधकांना सापडली आहेत. तो या महाजनपदांचा भौतिक रूपातील पुरावा आहे.

या ‘महा’ यादीमधे नसलेली राजकीयदृष्ट्या किरकोळ असलेली दोन जनपदे अशी आहेत, जी अन्य कारणाने महत्त्वाची ठरली. ती म्हणजे वैशालीचे गणराज्य आणि शाक्य गणराज्य! वैशाली गणराज्याच्या कुंडलपूरला राजा सिद्धार्थ आणि राणी त्रिशलादेवी यांच्यापोटी इ. स. पूर्व ५९९ मध्ये भगवान महावीरांचा जन्म झाला आणि शाक्य गणराज्यात राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांच्या पोटी इ. स. पूर्व ५६३ मध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला. (latest marathi news)

एकजण राजपुत्र ‘वर्धमान’ म्हणून, तर दुसरा राजपुत्र ‘सिद्धार्थ’ म्हणून जन्माला आला. या दोन महापुरुषांमुळे त्यांची जनपदे इतिहासात अजरामर झाली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापना केली, तर वर्धमान महावीरांनी २४ वे तीर्थंकर म्हणून जैन धर्माचे पुनरुज्जीवन केले. योगायोग असा, की हे दोघे महामानव समकालीन होते. महावीर हे गौतम बुद्धांपेक्षा सुमारे २५ वर्षांनी मोठे. महाजनपद कालखंडाची इतिहासाला सगळ्यात मोठी देणगी म्हणजे महावीर व गौतम बुद्ध.

महाजनपदांचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व चौथ्या शतकापर्यंत होता. त्यानंतर यातील मगध राज्य प्रबळ झाले. नंद वंशाने मगधाची सत्ता हाती घेतली आणि एक एक जनपद ताब्यात घेऊन नंद राजांनी पुन्हा एकवार प्रबळ केंद्रीय राजसत्ता उभी केली. जनपदे दुर्बळ होत गेली. काही वर्षांनंतर इ. स. पूर्व ३२१ मध्ये ही सगळी जनपदे मौर्य साम्राज्यात पूर्णपणे विलीन झाली.

तसे बघायला गेले, तर महाजनपदे कोणा एखाद्या राजवंशाच्या आधिपत्याखाली कधीही नव्हती. फार मोठा काळ ती टिकलीसुद्धा नाहीत. त्यांचे आपसांतील संबंध फार सौहार्दपूर्ण होते, असेही नाही. अलीकडच्या काळात, देश स्वतंत्र होत असताना जशी अनेक लहान-मोठी संस्थाने भारतात होती, तशीच त्या काळीही जनपदे होती. ती राजवंश म्हणून दुय्यम असतील, पण तरीही त्यांची दखल आपल्याला घ्यावीच लागेल.

राज्यातला सर्वांत मोठा शिलालेख

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

जुन्नर तालुका ऐतिहासिकदृष्ट्या खूपच संपन्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच भागातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यामुळं जुन्नर भागाविषयी देशात, विशेषतः महाराष्ट्रातील लोकांना बालपणापासून आकर्षण असतं. याशिवाय, जुन्नर भाग अडीच-तीन हजार वर्षांपासून कायम सत्तेच्या केंद्रभागी राहिलेला आहे. सातवाहनाचा उत्कर्षाचा काळ, त्यांचं वैभव आणि अफाट पसरलेले साम्राज्य या भागानं बघितलेलं आहे.

एवढंच नाही, तर संपूर्ण भारतात आढळणाऱ्या लेणींपैकी २०० ते २५० लेणी फक्त जुन्नर परिसरात अस्तित्वात आहेत. त्यामध्ये लेण्याद्री आहे, शिवनेरीच्या साखळी मार्गावर कोरलेली काही लेणी आहेत, अंबा-अंबिका-भीमाशंकर लेणीसमूह आहे, तुळजा सारखे दुर्मीळ चैत्यगृह असलेली लेणी आहेत. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत, अशी कितीतरी नावे सांगता येतील.

जुन्नरपासून थोड्या अंतरावर नाणेघाटची लेणी खोदण्यात आली. साधारण दोन हजार वर्षांपूर्वी व्यापार करण्यासाठी नाणेघाट येथे हा मार्ग ‘खोदून’ तयार करण्यात आला. त्या काळातील राष्ट्रीय महामार्ग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

पतीच्या निधनानंतर सक्षमपणानं राज्य चालवणाऱ्या सातवाहन सम्राज्ञी नागणिकाचं कर्तृत्व नाणेघाट येथील गुहेत कोरलेल्या शिलालेखातून आपल्याला समजतं. एवढंच नव्हे, तर सातवाहन राजा-राणी, युवराज यांचे पुतळेही या लेणीत कोरले होते, अगदी त्यांच्या नावासकट. आज मात्र त्यांच्या पायांचा काही भागच आपल्याला दिसतो.

या शिलालेखाचं ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व सर्वांत प्रथम उजेडात आणलं साइक्स यांनी. वर्ष १८३३ मध्ये मुंबईत असणाऱ्या ‘Bombay Literary Society’ मध्ये त्यांनी या शिलालेखाविषयीचा आपला शोधनिबंध सादर केला. खरंतर त्यांना हा शिलालेख पूर्णपणानं अनुवादित करता आला नव्हता.

पुढं, सन १८३७ साली साइक्स यांनी जॉन माल्कम यांच्यासोबत रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये 'Inscription from Boodh caves near Joonar' या सदराखाली शोधनिबंध प्रकाशित केला. या शोधनिबंधामुळं जेम्स प्रिन्सेप याचं लक्ष नाणेघाटकडं वळालं. साइक्स यांनी काही अक्षरांचा छाप घेतला होता, तो प्रिन्सेप यांना पाठवून दिला. तेव्हा लक्षात आलं, की हा शिलालेख ब्राह्मी लिपीत कोरण्यात आला आहे.

पुढं, वर्ष १८८३ मध्ये जेव्हा जेम्स बर्गेस यांनी ‘Report on the Elura cave temple and Bramhanical & Jain caves’ हा अहवाल प्रकाशित केला, तेव्हा त्यामध्ये जॉर्ज बुल्हर यांनी पहिल्यांदाच संपूर्ण शिलालेखाचं वर्णन केलं. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही लेणी एका राजघराण्यातील व्यक्तीनं तयार केली असल्याचं मत त्यांनीच सर्वप्रथम लिखित स्वरूपात मांडलं. ''पश्चिम भारतातील सर्वांत महत्त्वाचा लेख'' या शब्दात नाणेघाटाच्या शिलालेखाचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.

हा लेख केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर दख्खनमधील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकणारा अतिशय महत्त्वाचा पुरातत्त्वीय साधन म्हणून सुद्धा महत्त्वाचा आहे. लेण्यातील डाव्या बाजूच्या भिंतीवर दहा तसेच उजव्या बाजूच्या भिंतीवर दहा ओळी कोरण्यात आल्या आहेत. मधल्या बाजूला सातवाहन राजवंशातील नऊ महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे उभारले होते आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी शिलालेखात माहितीसुद्धा देण्यात आली होती.

हा लेख कोरण्यासाठी कारणीभूत असलेल्या सम्राज्ञी नागणिका राणीचा उल्लेख शिलालेखात 'नाग वरदायिनी', 'मासोपवासिनी', 'गृहतापसी', 'चरित ब्रह्मचर्या' या गौरवपर शब्दांनी केला आहे. या शिलालेखाची काही वैशिष्ट्ये आहेत. शिलालेखाच्या सुरुवातीस धर्म, इंद्र, संकर्षण, वसुदेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, वरुण, यम, कुबेर या देवांचा उल्लेख आढळतो. एवढ्या संख्येनं देवांचा उल्लेख एकाच ठिकाणी असलेला हा सर्वांत पुरातन शिलालेख आहे.

सम्राट अशोकाच्या शिलालेखात अनेक महत्त्वाच्या गोष्टी कोरण्यात आल्या होत्या. अशोकाच्या शिलालेखानंतर याच शिलालेखामध्ये फार मोठ्या प्रमाणात संख्यांचा वापर करण्यात आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. १, २, ६, ७, १०, १२, १७, १००, २००, ४००, ७००, एक हजार, चार हजार, सहा हजार एवढंच नव्हे तर दहा हजार आणि वीस हजार ह्या संख्याही इथे आढळून येतात.

महाराष्ट्राच्या तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीवर या लेखाच्या आधारे प्रकाश पडतो. त्याचबरोबर प्राचीन काळी होत असणाऱ्या यज्ञविधींचेही उल्लेख या शिलालेखात आढळतात. या राजवंशातल्या राणी नागणिकानं अश्वमेध, राजसूय, अंगीरस अशा तब्बल १५ यज्ञांचं आयोजन केलं होतं. पुष्कळ प्रमाणात दानधर्मही केला होता. त्याचबरोबर, 'कार्शापण' आणि 'प्रसर्पक' या नाण्यांचा लिखित स्वरूपातील हा पहिला पुरावा आहे. एकप्रकारे हा लेख म्हणजे राणीचं जीवनचरित्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

'सिमुक सातवाहन', 'सिरी सातकर्णी' आणि 'देवी नागणिका' यांच्यासहित परिवारातील इतर सहा महत्त्वाच्या व्यक्ती, असे एकूण नऊ पुतळे इथे कोरण्यात आले होते. पण हे पुतळे काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. जर आज ते पुतळे अस्तित्वात असते, तर बहुदा सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींना आपण 'याची देही याची डोळा' पाहू शकलो असतो.

एकूणच काय, तर नाणेघाटाच्या शिलालेखातून बऱ्याच चकित करणाऱ्या गोष्टी सहजतेने उलगडत जातात आणि त्याचे सर्वस्वी श्रेय जॉर्ज बुल्हर, भगवानलाल इंद्रजी, वा. वि. मिराशी, दिनेशचंद्र सरकार आणि शोभना गोखले यांनाच जाते. ब्राह्मी लिपीमध्ये भारतातील बहुसंख्य शिलालेखांची निर्मिती झाली आहे.

अशोकाचे प्रस्तरलेख, स्तंभलेख, महाराष्ट्रातील बुद्ध तसेच जैन आणि इतर अनेक लेण्यांमध्ये आढळणाऱ्या शिलालेखांची लिपी ब्राह्मी आहे. त्यामुळं, ज्याला कुणाला ब्राह्मी लिपी शिकण्याची इच्छा आहे, त्यासाठी नाणेघाट सर्वोत्तम शिलालेख किंवा सर्वोत्तम ठिकाण म्हणून आपल्यासमोर उपलब्ध आहे. तेथील अक्षरं ठळक आहेत. सर्वप्रकारच्या शब्दांची आपल्याला ओळख होते.

डेक्कन कॉलेजमध्ये माझे मास्टर्स सुरू असताना डॉ. दांडेकर सरांनी आम्हाला इथे ब्राह्मी लिपीविषयी महत्त्वाची माहिती सांगत वाचण्यासाठी मार्गदर्शन केले होते. आम्ही इथंच ब्राह्मी खऱ्या अर्थानं शिकलो. या लेणीच्या समोरून जो मार्ग जातो, त्यावर एक दगडी रांजण ठेवलेलं आहे. हा व्यापारी मार्ग असल्यामुळं या भल्यामोठ्या दगडी रांजणात जकातीची नाणी जमा करण्यात येत असत असं सांगण्यात येतं. पण त्याला कसलाही पुरावा नाहीये.

नाणेघाट समृद्ध आहे. पावसाळ्यात स्वर्गासम भासणारा हा भाग आहे. जवळच चावंड, जीवधन, निमगिरी हे किल्ले तर कुकडेश्वरसारखं अतिसुंदर मंदिर आहे. हा संपूर्ण भाग पाहायला निदान दोन दिवस तरी हवेत.

(लेखक पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

मध्य प्रदेशातल्या बाघ गुहा

सकाळ वृत्तसेवा

- प्रवीण वाघमारे, pravinwagh727@gmail. com

मध्य प्रदेशातल्या बाघ गुहाचित्रांचा कालखंड निश्चितपणे सांगता येत नसला तरी तो इसवीसन ६२६-६२८ असा मानला जातो. इथली लेणी महायान बौद्ध पंथाची असून ही गुहाचित्रं एकाच वेळी रंगवलेली असावीत. इथल्या नऊपैकी पाच गुहा पाहता येतात. त्यातही मोजकीच चित्रं अस्तित्वात असून तीही अत्यंत खराब अवस्थेत आहेत. मात्र, ही चित्रं अजिंठा शैलीसारखीच असल्याचं दिसतं. हा चित्रसंस्कृतीचं दर्शन घडवणारा अनमोल ठेवा आहे.

मध्य प्रदेशात ग्वाल्हेरजवळील विंध्य पर्वतरांगांमध्ये बाग्मती (बाघिणी) या नदीपासून दोन-तीन मैलांवर ‘बाघ’ नावाच्या गावाजवळ या गुहा आहेत. म्हणूनच त्यांचं नाव ‘बाघ गुहा’ असं पडलं असावं. बाघ लेणी हे गुप्तकाळातलं एक उत्तम उदाहरण आहे. इथले लेखी पुरावे दुर्दैवानं नष्ट झालेले आहेत. इथल्या मिरवणुकीच्या चित्रावर ब्राऊन (तपकिरी) रंगाचं ‘के’ हे अक्षर असल्याचं दिसतं.

मात्र, निश्चित कालखंड सांगता येत नाही. कला-इतिहासकार व्हिन्सेंट स्मिथ यांनी लेण्यांचा काळ इसवीसन ६२६-६२८ असा मानला आहे; कारण, या लेण्या अजिंठ्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या लेण्यांशी समकालीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बाघ लेण्या महायान बौद्ध पंथाच्या आहेत. भिक्षूंच्या निवासासाठी आणि प्रवचनांसाठी त्या बांधली गेल्या असाव्यात. या गुहांचा शोध लेफ्टनंट डेंजरफील्ड यांनी लावला. इथल्या गुहाची एकूण संख्या नऊ असून त्या सर्व ‘विहारगुंफा’ आहेत.

बाघ लेण्या तशा अनेक नावांनी प्रचलित आहेत. त्यातल्या पहिल्या गुहेला ‘गृह गुंफा’, दुसऱ्या लेणीला ‘गुसाई’ किंवा ‘पंच पांडू’ लेणी म्हणतात. तिसरी लेणी ‘हत्तीखाना’, चौथी लेणी ‘रंगमहाल’, पाचवी लेणी ‘पाठशाळा’ म्हणून ओळखली जाते. सहा, सात, आठ आणि नऊ या क्रमांकाच्या गुंफांकडं जाणारे मार्ग बंद आहेत, त्यामुळे या लेण्यांना कोणतंच नामाभिधान नाही.

या लेण्यांमध्ये चित्रमालिका असून ही चित्रं फ्रेस्को पद्धतीनं साकारल्याचं आढळतं. गुंफांची चित्रमालिका प्रत्येक गुहेच्या दरवाजानं एकमेकींपासून वेगळी होते. फ्रेस्को पद्धती म्हणजे, प्रथम रेखांकन रेखाटल्यानंतर त्यामध्ये सपाट रंग भरले जातात, नंतर गडद रंगाच्या साह्यानं बाह्य रेषा ठळक करून ते चित्र पूर्ण केलं जातं. या पद्धतीनं इथली चित्रमालिका उत्कृष्टपणे तयार केलेली आढळते. फ्रेस्को पद्धतीच्या कलाकृती जगभरातल्या वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केल्या गेल्याचं आढळतं.

बाघ लेण्यांचे खडक मऊ असल्यामुळे इथला गिलावा लवकर नष्ट झाला असावा. इथल्या चित्रांमध्ये वापरलेले रंग बहुधा त्यांच्या भागातून मिळालेले असावेत. या रंगांमध्ये डिंक मिसळून रंगलेपन केलं गेलं आहे. काळा, पांढरा आणि जांभळा या रंगांनी ही रेखाचित्रं तयार केली गेली असून आणि लाल, निळा, पिवळा यांसारखे विरोधाभासी रंगही वापरण्यात आले आहेत. बाघ गुहेतली सर्व चित्रं एकाच वेळी तयार केलेली दिसून येतात. त्यांत जीवनाचे विविध पैलू चित्रित केलेले आहेत. राजेशाही जीवन व उल्हासपूर्ण जीवनशैली या चित्रांत दाखवण्यात आली आहे.

सात गुहांमधली चित्रं जवळपास पूर्णतः नष्ट झाली आहेत. चार आणि पाच या क्रमांकांच्या गुहांमध्ये काही चित्रं उपलब्ध आहेत, तीही खराब अवस्थेत. चौथ्या आणि पाचव्या लेण्यांमध्ये दोनशे फूट छत वीस खांबांवर आधारलेलं होतं. हे छत कोसळल्यामुळं पंधरा फूट चित्रफलक नष्ट झाला आणि चित्रांचं नुकसान झालं.

पहिली गुहा ही बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी बांधण्यात आली होती. या गुहेमध्ये कोणत्याही मूर्ती किंवा चित्र आज उपलब्ध नाही. दुसऱ्या गुहेतील भिंती एकेकाळी पूर्णपणे रंगवलेल्या होत्या. त्या भिंतींवर प्राण्यांची-पक्ष्यांची चित्रं होती. बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन आज त्या ठिकाणी काहीच अस्तित्वात नाही. तिसरी गुहा ‘हत्तीखाना’ या नावानं ओळखली जाते.

ही गुहा गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या चित्रांनी भरलेली होती; परंतु काळानुसार भिंतींवरचा गिलावा उडाला. आता या गुहांमध्येही चित्र राहिली नाहीत. मात्र, जे काही थोडंफार शिल्लक आहेत त्यात एका हातात कमळ घेतलेल्या उपासकांची मानवाकृती स्पष्ट दिसते, तसंच भूमीला स्पर्श करणाऱ्या स्त्रीचं अस्पष्ट चित्र दिसतं.

‘रंगमहाल’ नावाच्या चौथ्या गुहेबाहेर व्हरांड्यावर ४५ फूट लांब आणि सहा फूट रुंद असा तुकडा शिल्लक आहे. याच्यावर आकर्षक चित्रं आढळतात. या रंगवलेल्या फलकाची व्याप्ती पाचव्या गुहेच्या प्रवेशद्वारापर्यंत आहे. या तुकड्यात सहा चित्रमालिका आहेत. पहिलं चित्र ‘वियोगा’चं आहे. चित्राच्या मध्यभागी एक स्त्री खिडकीजवळ बसलेली असून ती शोक करत आहे.

उजव्या हातानं चेहरा झाकून घेत ती रडत आहे, तर दुसरी स्त्री तिचं सांत्वन करत आहे आणि सहानुभूतीच्या भावनेनं तिच्याकडं पाहत आहे. हे भाव प्रकट करण्यासाठी कबूतरांची जोडी खाली बसलेली आहे. असं हे प्रतीकात्मक चित्र आहे.

या गुहेतलं दुसरं दृश्य ‘मंत्रणा’चं आहे. यात चार गृहस्थ निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या गोल उशीवर बसून गंभीर संभाषणात गुंतलेले दिसत आहेत. त्यांच्या डावीकडच्या दोन व्यक्तींच्या डोक्यावर मुकुट आहे. यातला पहिला ‘मंत्री’ असून, दुसरा राजेशाही पोशाख घातलेला आहे. एका राजेशाही व्यक्तीनं बौद्ध धर्म स्वीकारण्याशी संबंधित बहुतेक ही प्रसंग असावा.

तिसऱ्या दृश्यात सहा लोकांचा एक गट आहे. त्यांत काही गंधर्व आणि काही भिक्षू असून या सर्व मानवाकृतींचं मुंडण केलेलं आहे. चौथं दृश्य पाच गायिकांचं आहे; परंतु हे चित्र ज्या भिंतीवर आहे त्या भिंतीचा खालचा भाग नष्ट झाल्यामुळे हे दृश्य कमरेपर्यंतच दिसतं. मध्यभागी असलेल्या महिलांच्या हातात वीणेसारखं वाद्य आहे. या चित्रांमध्ये इराणी निळा रंग भरलेला आहे.

पाचवं दृश्य नर्तिकेचं आणि वाद्यवादनाचं आहे. या चित्रात दोन गट आहेत. पहिला गट सात महिला आणि एक पुरुष असा आहे. या महिला पुरुषाभोवती नृत्य करत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. दुसरा गट सहा महिलांचा असून त्या गायनाच्या, नृत्याच्या मुद्रेत उभ्या आहेत. नर्तिकेचे केस खांद्यापर्यंत आहेत.

सहाव्या दृश्यात १७ घोडेस्वार रांगेत उभे असून ते डावीकडं जात असल्याचं दिसतं. आठव्या दृश्यात हत्तीची मिरवणूक आहे. सहा हत्ती आणि तीन घोडेस्वार अशी रचना या चित्रात आहे. याशिवाय बोधिसत्त्वांची वेगवेगळी विशाल चित्रं या गुहेत आहेत. या गुहेच्या खांबांवर सुंदर नक्षीकाम आहे.

पाचव्या गुहेत अनेक चित्र आहेत. त्यापैकी गौतम बुद्ध यांचं सुंदर चित्र शिल्लक आहे. इथं कमळ, फुलं, वेली, प्राणी, पक्षी आणि लहान-मोठी फळंही विविध ठिकाणी चित्रित करण्यात आलेली आहेत.

अजिंठा आणि बाघ या दोन्ही ठिकाणी स्त्रियांचं आध्यात्मिक आणि शारीरिक सौंदर्य अतिशय उत्तम प्रकारे चित्रित करण्यात आलं आहे. या चित्रांच्या रेषा, आकार, रंग, रचना, भिंतीचित्राची प्रक्रिया, शब्दलेख आणि अभिव्यक्ती इत्यादी सर्व काही अजिंठ्यातल्या चित्रांसारखंच आहे.

(लेखक हे कोल्हापूरमधल्या एका खासगी कलाशिक्षण संस्थेत सह अधिव्याख्याता आहेत, तसंच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची चित्रप्रदर्शनं भरवली जातात.)

राजवंश भारती : नेपाळ राजवंश

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

राजवंश ‘भारती’मध्ये नेपाळच्या राजवंशाची माहिती कशासाठी? हा प्रश्न एखाद्याला पडू शकतो. त्यासाठी आधीच हे स्पष्ट करणं आवश्यक आहे, की नेपाळ हा देश म्हणून इ.स. १७६८ मधे अस्तित्वात आला. प्राचीन काळी तो बृहधा भारताचाच एक प्रदेश होता. रामायण काळात सीतेचे माहेर असलेली मिथिला नगरी म्हणजे आजचे नेपाळमधील जनकपूर, असा एक दावा आहे. गौतम बुद्धांची जन्मभूमी लुंबिनी तर नेपाळमध्ये आहेच. त्यामुळे नेपाळचा प्राचीन इतिहास हा शेवटी भारताचाच इतिहास आहे. (nashik saptarang latest article rajvansh bharati marathi news)

‘गोपाल राजवंशावली’ या भूर्जग्रंथाची पाने.

‘गोपाल राजवंशावली’ या भूर्जग्रंथाची पाने.esakal

काश्मीरच्या राजवंशाची माहिती देणारा ‘राजतरंगिणी’ हा जसा प्राचीन ग्रंथ आहे, तसाच नेपाळच्या राजवंशाची माहिती देणाराही एक जुना ग्रंथ आहे - ‘गोपालराजवंशावली’. ब्रिटिशांच्या राजवटीत प्रो. सेसिल बेंडॉल या संशोधकाला १८९९ मध्ये काठमांडूच्या शाही ग्रंथालयात एक भूर्जपत्रांचा हस्तलिखित ग्रंथ सापडला.

त्यात नेपाळच्या प्राचीन राजघराण्यांची यादी आणि संक्षिप्त माहिती दिलेली होती. त्यात पहिला राजवंश ‘गोपाल’ हा होता. त्यामुळे या ग्रंथाला ‘गोपालराजवंशावली’ हे नाव रूढ झाले. हे मूळ हस्तलिखित ४८ भूर्जपत्रांचे आहे. ते पृष्ठ क्रमांक १७ पासून उपलब्ध आहे. म्हणजेच त्याची पहिली १६ पाने गायब झाली (केली?) आहेत.

डॉ. जॉर्ज बुहलरसारखे पाश्चात्त्य आणि श्री कमलप्रकाश मल्लासारखे अर्वाचिन संशोधक या ग्रंथातील निवडक भाग उचलून तेवढाच इतिहास मानतात. त्यामुळे त्यांच्या मते ही राजांची यादी नेपाळ संवत् १७७ ( इ.स. १०५७) पासून सुरू होते. त्या आधी चे सर्व काल्पनिक! पण, श्री.कोटा वेंकटाचलम् या तेलुगू विद्वानाने अनेक वर्षांच्या अभ्यासांती ‘राजतरंगिणी’ आणि ‘गोपाल राजवंशावली’ या दोन्ही ग्रंथात नमूद राजांची पुनर्लिखित साधार यादी तयार केली. (Latest Marathi News)

Ashoka Pillar at Lumbini, birthplace of Lord Buddha. Photograph from 1956.

या यादीनुसार नेपाळ चा राजवंश थोडक्यात असा आहे -

१) गोपाल राजवंश : हा वंश इसवी सनापूर्वी ४१५९ मध्ये, महाभारत युद्धाच्या सुमारे हजार वर्षे आधी सुरू होतो, असे म्हटले आहे. याचा पहिला राजा 'मुक्तमानगुप्त' हा होता. या वंशाचे ८ राजे होऊन गेले. त्यांची सत्ता एकूण सुमारे ५०० वर्षे होती. शेवटला राजा यक्षगुप्त.

२) अहिर वंश : यालाच महिषपाल वंश ही म्हटले आहे. याच्या केवळ तीन पिढ्या झाल्या .. वरसिंह, जयमतसिंह आणि भुवनसिंह. त्यांनी अंदाजे २०० वर्षे राज्य केले. राजाच्या नावापुढे 'सिंह' ही उपाधी लावण्याची पद्धत या वंशाने प्रथम सुरू केली असे म्हणतात. अर्थात याचा स्पष्ट पुरावा नाही.

३) किरात वंश : 'यलांबर' नावाच्या राजापासून किरात वंश सुरू झाला. त्यातील २९ राजांनी एकूण ११०० वर्षे राज्य केले. 'गस्ती' हा किरात वंशातील अखेरचा राजा होता. द्युमती हा किरात राजा पांडवांना समकालीन होता.

३) सोमवंश : निमिष राजा पासून सोमवंशाची सत्ता सुरू झाली, ती भास्करवर्मन पर्यंत. भास्करवर्मन फार पराक्रमी होता. त्याने आपले राज्य बरेच विस्तारले. त्याला मूल नसल्याने त्याने भूमिवर्मन याला दत्तक घेतले. हा वंश सुमारे ६०० वर्षे गादीवर होता. नेपाळमधे जनश्रद्धा अशी आहे की काठमांडू मधील सुप्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराची मूळ स्थापना सोमवंशाच्या राजवटीत झाली आहे. कालौघात ते वेळोवेळी पडले आणि पुन्हा नव्याने बांधले गेले, तो भाग वेगळा!

४) सूर्यवंश : भूमिवर्मन हा सूर्यवंशी राजा म्हणून गादीवर बसला. त्याच्यापासून सूर्यवंशाची राजवट सुरू झाली. हा वंश प्रदीर्घ काळ- इ.स. पूर्व १७११-१२ ते इ.स. पूर्व १०१, अशी १६१० वर्षे सत्तेवर होता. त्या काळात सुमारे ३० राजे होऊन गेले. अखेरचा विश्वदेववर्मन. (Latest Marathi News)

५) ठाकुरी वंश : विश्वदेववर्मनाचा जावई अंशुवर्मन 'ठाकुरी' वंशाचा होता. तो राजा झाला आणि ठाकुरी वंशाची सत्ता आली. याच अंशुवर्मन च्या कारकीर्दीत उज्जैनीचा प्रतापी सम्राट विक्रमादित्य नेपाळमधे येऊन गेला. त्याने 'शकारि' ही पदवी धारण करून इ.स. पूर्व ५७ मध्ये 'विक्रम संवत्' या कालगणनेला सुरवात केली.

नेपाळ मधे आजही विक्रम संवत् ही नेपाळ शासनाची अधिकृत दिनदर्शिका आहे. ठाकुरी वंशाच्या राजवटीत मध्यंतरी काही काळ लिच्छवी गणराज्याची सत्ता नेपाळ मधे होती. नंतर राजा राघवदेवाने पुन्हा ठाकुरी वंश सत्तेवर आणला. त्याने इ.स. ८७९-८० मधे स्वतंत्र "नेपाळ संवत" सुरू केला. अनेक राजांच्यानंतर विजयकामदेव हा या वंशाचा शेवटचा राजा झाला.

६) मल्ल वंश : ठाकुरी वंशाच्या पतनानंतर इ.स.१२०१ मधे अरिदेव मल्ल याने मल्ल वंशाची राजवट सुरू केली. या राजवटीत नेपाळ सर्व आघाड्यांवर सुस्थितीत होते. 'मैथिली' भाषा आणि 'नेवारी' लिपी याच काळात बहरली. या वंशाचा राजा 'जयस्थिती मल्ल' याच्या कारकीर्दीत, बहुधा इ.स. १३९० च्या सुमारास, 'गोपाल राजवंशावली' हा ग्रंथ लिहिला गेला. त्यामुळे तिथवरच्या नोंदी या वंशावळीत आहेत. या ग्रंथाचा काही भाग संस्कृत मधे तर काही नेवारी लिपीत आहे. जयस्थितीमल्ला नंतर मल्ल वंशाला उतरती कळा लागली. राज्य चार भागांमधे विभागले गेले.

७) गुरखा / गोरखा वंश : नेपाळमधे १५-१६ वे शतक हा राजकीय धामधुमीचा काळ होता. लहान मोठ्या राजवटी ठिकठिकाणी राज्य करीत होत्या. दुसरीकडे इस्लामी आक्रमकांचे हल्ले सुरू झाले होते. अशा वातावरणात इ.स. १५५९ मधे गुरखा राजकुमार द्रव्य शाह याने अशाच काही राजवटी ताब्यात घेऊन 'शाह' अथवा 'गुरखा राजवंश' स्थापन केला. याच वंशातील १० वा राजा पृथ्वी नारायण शाह हा १७४३ साली गादीवर आला.

त्याने मल्ल राजवटीच्या अखेरच्या शासकांना पराजित करून, जवळ जवळ सगळा नेपाळ एकत्र करूनआपल्या आधिपत्याखाली आणला. सन १७६८ मधे त्याने नेपाळ हे स्वतंत्र राज्य अथवा देश म्हणून; आणि स्वतः:ला त्या राज्याचा राजा म्हणून घोषित केले. इथपासून नेपाळ हा भारतवर्षाचा एक प्रदेश न राहता तो एक स्वतंत्र देश झाला.

राजवंश भारती : काश्मीर राजवंश - राजतरंगिणी

सकाळ डिजिटल टीम

लेखक : ॲड. सुशील अत्रे

‘इतिहास’ या विषयावरती रचलेला भारतातील पहिला ग्रंथ म्हणजे ‘राजतरंगिणी’. काश्मीरमधील बाराव्या शतकातील एक विद्वान व कवी 'कल्हण' याने हा ग्रंथ लिहिला आहे. राजतरंगिणी याचा अर्थच मुळी ‘राजांची नदी’ असा आहे. कल्हण पंडित हा बाराव्या शतकातील काश्मीरनरेश हर्ष ते राजा जयसिंह यांच्या दरम्यानच्या काळात होऊन गेला.

त्याने (बहुदा राजाज्ञेवरून) काश्मीर प्रांताचा अगदी प्राचीन काळापासूनचा राजकीय इतिहास नोंदला आहे. त्यासाठी त्याने त्याच्याआधी होऊन गेलेल्या अकरा इतिहासकारांचा आधार घेऊन त्यांचा ऋणनिर्देशही ग्रंथात केला आहे. याशिवाय अनेक प्राचीन (तेव्हा प्राचीन!) दानपत्रे, नाणी, ताम्रपट इत्यादिंचाही आपण अभ्यास केल्याचे कल्हण लिहितो. (Nashik saptarang latest article by adv sushil atre marathi news)

सम्राट ललितादित्य मुक्तापीडाची नाणी

सम्राट ललितादित्य मुक्तापीडाची नाणीesakal

राजतरंगिणी मध्ये एकूण आठ 'तरंग' अथवा प्रकरणे आणि जवळजवळ ८००० श्लोक आहेत. त्यांमध्ये महाभारत काळापासूनच्या विविध राजांची व राजवंशांची माहिती दिलेली आहे. काश्मीरला आधी कश्यपमेरू (कश्यपमीर) असे नाव होते, हेदेखील कल्हण लिहितो.

तेव्हापासून प्रचलित असलेला मौखिक इतिहास कल्हणाने सुरवातीच्या २/३ तरंगांमध्ये दिला आहे. पुढे ७ व्या- ८ व्या तरंगातील राजवंश तर त्याने स्वत: पाहिले आहेत. राजतरंगिणीतील वंशावळी व कालक्रम याबद्दल आधुनिक अभ्यासकांमधे एकमत नाही. पण, या ग्रंथाचे ऐतिहासिक योगदान वादातीत आहे.

यात कल्हणाने इ.स. पूर्व ३१५० (महाभारत युद्ध) ते इ.स. ११५० (ग्रंथलेखन समाप्ती ) एवढा विस्तीर्ण कालपट उलगडला आहे. कालगणनेसाठी कल्हणाने ‘कलिवर्ष’ आणि 'लौकिकवर्ष' ही परिमाणे वापरली आहेत.'राजतरंगिणी' च्या आधारे काश्‍मिरी राजवंशांचा संक्षिप्त आढावा असा घेता येईल.. (Latest Marathi News)

Martand Sun Temple, Anantnag

१ ला तरंग - यात 'गोनन्द' वंशातील राजे आहेत. या वंशाचा आद्य राजा गोनन्द-पहिला हा ज्येष्ठ पांडव युधिष्ठिराचा समकालीन आहे. या वंशातील सुमारे ७५ राजांची यादी कल्हणाने दिली आहे. त्यात अखेरचा राजा म्हणजे 'अंध युधिष्ठिर'.

२ रा तरंग - यात प्रतापादित्य वंशातील ६ राजांचा उल्लेख आहे. त्यांनी एकूण १९२ वर्षे राज्य केले. यांच्यापैकी जलौक हा राजा काश्मिरी दंतकथांचा नायक आहे. या वंशातील 'संधिमती' हा राजा सत्तेवर असताना इसवी सन सुरु झाले.

३ रा तरंग - उत्तर गोनन्दीय वंशाची राजवट. मेघवाहनापासून ते बालादित्यापर्यंत १० राजे या वंशात होऊन गेले. त्यांची कारकीर्द एकूण सुमारे ५४० वर्षांची होती. या राजवटीतील काही प्राचीन नाणी उत्खननात आढळून आली आहेत.

४ था तरंग - नागवंशाची एक शाखा असलेला कर्कोट वंश काश्मीरमध्ये ७ व्या शतकात सत्तेवर आला. दुर्लभवर्धन हा कर्कोट नागवंशीय इसम गोनन्द राजा बालादित्याचा जावई, म्हणजे त्याची मुलगी अनंगलेखा हिचा पती होता. त्याने इ.स. ६२५ च्या आसपास आपल्या वंशाची राजवट सुरू केली. या वंशातील १७ राजांचा उल्लेख राजतरंगिणीत आहे.

काश्मीरचा सगळ्यात प्रसिद्ध राजा 'ललितादित्य मुक्तापीड' हा याच वंशातील राजा होता. तो इ.स. ७२५ ते ७६० या काळात गादीवर होता. याच्या कारकीर्दीत काश्मीरचे राज्य सामर्थ्याच्या शिखरावर होते. आज उद्ध्वस्त अवस्थेत असलेले अनंतनागचे प्रसिद्ध 'मार्तंड सूर्यमंदिर' ललितादित्यानेच बांधले आहे.

महंमद बिन कासीमच्या सिंध मोहिमेनंतर झालेल्या अरबी आक्रमणाला थोपवून अरबांना धूळ चारणारा ललितादित्यच होता. कनौज सम्राट यशोवर्मन या बलाढ्य राजाशी ललितादित्याने युद्ध करून त्याला पराभूत केले होते. कर्कोट वंशातील अखेरचा राजा 'उत्पलपीड' होता. (Latest Marathi News)

Martand Sun Temple, Anantnag

५ व ६ वा तरंग - इ.स. ८५५ पासून उत्पल राजवंशाला सुरवात झाली. तिची स्थापना स्वत: उत्पलपीडाने नव्हे, तर त्याचा नातू अवंतीवर्मन याने केली. त्याच्यापासून ते काश्मीरच्या इतिहासात प्रसिद्ध आणि 'मोठी बहीण' या अर्थी नाव असलेली राणी 'दिद्दा' हिच्यापर्यंत- इ.स. १००३ पावेतो, होऊन गेलेल्या राजांची यादी या दोन तरंगांमधे उत्पल -१ व उत्पल -२ अशी आहे. हा राजवंश जेमतेम दीडशे वर्षे सत्तेवर होता.

७ व ८ वा तरंग - दिद्दा राणीचा भाचा संग्रामराज याला दिद्दा नंतर राजगादी मिळाली. त्याच्यापासून 'लोहारा' वंश सुरू झाला. या वंशात 'हर्ष' नावाचा राजा होता. कल्हणाचे वडील चंपक हे या हर्ष राजाचे महामंत्री होते. ७ वा तरंग हर्षापाशी संपतो. नंतर लोहारा वंशाचाच उच्छल याच्यापासून द्वितीय लोहारा वंश सुरू होतो. त्यातील राजा जयसिंह हा कल्हणाचा आश्रयदाता होता. त्याची कारकीर्द सुरु असतानाच इ.स. ११४८-४९ मध्ये कल्हणाने आपला ग्रंथ पूर्ण केला. इथे मूळ राजतरंगिणी संपते.

जयसिंहाची इ.स. ११५४ मध्ये हत्या झाली. त्याच्यानंतर सुद्धा सुमारे १५ राजे काश्मीरच्या राजगादीवर आले आणि गेले. यातली अखेरची शासक पुन्हा एक राणी होती. तिचे नाव 'कोटा राणी'. इ.स. १३३९ मधे शाह मीर याने तिची हत्या केली आणि काश्मीरचे हिंदू साम्राज्य संपवले. सुलतान शम्सुद्दिन' या नावाने तो गादीवर बसला. अशा प्रकारे, इ.स. पूर्व ३१५० पासून इ.स. १३३९ पर्यंत गोनन्द, कर्कोट, उत्पल आणि लोहारा या चार प्रमुख वंशांनी काश्मीरवरती राज्य केले.

‘राजतरंगिणी’ मुळे हे सर्व राजे, त्यांची वंशावळ, त्यांचा कारभार याची माहिती आपल्याला आयती मिळाली. हा मूळ ग्रंथ प्राचीन शारदा लिपीत लिहिला होता. त्याची प्रत एका काश्मिरी कुटुंबाने जपून ठेवली होती. ती मिळाल्यावर त्याची देवनागरी प्रत तयार केली. तिचे इंग्रजीत भाषांतर १९ व्या शतकात एम् ए. स्टाईन याने केले.

मराठी भाषांतर १९२९ मधे वामनशास्त्री लेले यांनी, तर अलिकडे २०१७ मधे प्रख्यात विदुषी अरुणा ढेरे व श्री.तळणीकर यांनी केले आहे. १९९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना विचारलेल्या ‘रालीव, गलीव या सलीव..’ या तीनशब्दी विषारी प्रश्नाला ११५० च्या दशकातील आठ हजार श्लोकांचे उत्तर आहे ‘राजतरंगिणी’!

पल्लवांचं वैभवशाली महाबलीपुरम

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

तमिळनाडू अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. देशातलं दक्षिणेकडील राज्य आणि आग्नेय आशियासोबत कमीत कमी हजार वर्षांपासूनचे संबंध अबाधित ठेवणारा भूभाग म्हणून तमिळनाडू प्रसिद्ध आहे. पल्लव, चोळ, मराठ्यांसारख्या राजसत्तांनी या राज्यात अनेक धार्मिक वास्तू उभारल्या, महाल उभारले, ग्रंथालयं उभारली.

तमिळनाडूमधील मंडगपट्टू येथे पल्लव राजा महेंद्रवर्मन याने पहिली शैवलेणी खोदली. ‘वीट, लाकूड अथवा कोणत्याही धातूविरहित’ ही वास्तू उभारण्यात आल्याचा शिलालेख महेंद्रवर्मननं कोरून ठेवला.

यानंतर तमिळनाडूत स्थापत्यामध्ये फार मोठा बदल घडला. पल्लव आणि बदामी चालुक्यांच्या सततच्या युद्धामुळं जितके अनिष्ट परिणाम या भागावर झाले, तेवढ्याच प्रमाणात कलेची देवाणघेवाण या दोन राज्यांमध्ये झाली. पल्लवांच्या स्थापत्यशैलीचे मुख्यत्वे तीन भाग पडतात आणि हे तिन्ही टप्पे तीन राजांच्या नावे ओळखले जातात. पहिल्या टप्प्यात लेण्यांची निर्मिती दिसते, ज्याचं श्रेय जातं महेंद्रवर्मनला.

दुसऱ्या टप्प्यात लेणी मंदिर, एकाश्म मंदिर (केवळ एका दगडातून साकारलेलं ) आणि काही प्रमाणात बांधीव मंदिरांचा प्रयोग आढळतो. याचं श्रेय नरसिंहवर्मनला जातं. तिसऱ्या टप्प्यात पूर्णपणे बांधीव मंदिरांची उभारणी झाली, ज्याचा निर्माता राजसिंहवर्मन आहे. हे तीन पल्लव राजे आणि त्यांच्या काळात विकसित होत गेलेल्या स्थापत्यशैलीचा प्रभाव कांची आणि परिसरात आपल्याला पाहायला मिळतो.

कांचीपुरम पासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर एक महत्त्वाचं शहर समुद्र किनाऱ्यावर वसलंय. जिथं दीड हजार वर्षांपूर्वी पल्लव राजा नरसिंहवर्मन आपल्या प्रचंड फौजेनिशी येत असे, या भागात वावरत असे, समुद्र किनाऱ्याच्या बाजूला असलेल्या दगडांमध्ये एक वेगळीच दुनिया तयार करण्याची जबाबदारी त्यानं अनेक कलाकारांना दिली आणि एका समृद्ध शहराची उभारणी केली. त्या अतिशय सुंदर शहराला नाव देण्यात आले ‘मामल्लपुरम’ ऊर्फ ‘महाबलीपुरम’.

नरसिंहवर्मन याचा उल्लेख कित्येकदा ‘मामलं’ म्हणून करण्यात आलाय. मामल्ल म्हणजे महान मल्ल. त्याच नावापासून महाबलीमपुरम रूढ झाल्याचं मत अनेक अभ्यासकांचं आहे. दुसरीकडं, दानशूर राजा बळी याच्याशीही या गावाचा इतिहास जोडला गेल्याचा उल्लेख स्थानिक लोक आवर्जून करतात. पौराणिक तसेच ऐतिहासिक कथांनी हा प्रदेश समृद्ध झालेला आहे.

महाबलीपुरम गावात अनेक लेणी, अनेक बांधीव मंदिरं आणि एकाश्म मंदिरं जगप्रसिद्ध आहेत. ही पाच एकाश्म मंदिरं ‘पंच रथ’ नावाने लोकांच्या परिचयाची आहेत. त्यांची नावे सुद्धा लोकप्रिय पांडवाच्या नावावरूनच ठेवण्यात आली आहेत.

अर्जुन आणि कुंती रथ जवळ जवळ आहेत. सर्वांत मोठ्या रथाला ‘भीम रथ’ नावाने ओळखतात. त्याच्या बाजूला ‘धर्मराज रथ’ आहे तर समोर ‘नकुल-सहदेव रथ’ आहे. या पाच रथांसोबत एकाच दगडात कोरलेले नंदी, सिंह आणि हत्तीचं भव्य शिल्प आहे. धर्मराज रथावर बरेच शिलालेख आहेत. हे सर्व रथ आणि त्यांची निर्मिती सातव्या शतकातील. त्यासाठी हा नरसिंहवर्मन राजा कारणीभूत ठरला.

इथून काहीसं पुढं गेल्यावर आपल्याला अनेक लेणी लागतात. कृष्णानं गोवर्धन पर्वत उचलल्याची किंवा गोकुळात आपल्या मित्रांसोबत मजामस्ती करतानाची गोष्ट एका लेणीत कोरून ठेवली आहे. त्याच्यापुढं सत्तर-ऐंशी फुटांच्या भल्यामोठ्या दगडी भिंतीवर गंगावतरण शिल्प कोरलंय.

पण यात केवळ गंगा पृथ्वीवर अवतरत आहे, एवढचं कोरलं नाही तर त्या वेळी पृथ्वीवर काय काय घडत होतं, त्या भगीरथानं कसे प्रयत्न केले, भगवान शिवाची आराधना करणारे साधू आणि पृथ्वीवरील अनेक प्राणी हे त्या भव्यदिव्य शिल्पात अगदी जिवंत वाटावेत असे कोरले आहेत.

महिषासुरमर्दिनी लेणीमध्ये तर सिंहावर आरूढ झालेली दुर्गा आणि म्हैस आणि मनुष्य यांच्या मिश्ररूपात महिषासुराचं आठ-दहा फुटांचं शिल्प आपलं लक्ष वेधून घेतं. गणेश मंदिर, ब्रह्मा-विष्णू-महेश यांची छोटेखानी लेणी, एका दगडावर कोरलेले माकड, सिंह, हत्ती यांसारखे प्राणी हे सगळं पाहत आपण येऊन पोचतो वराह लेणीच्या समोर. या लेणीचं छत पूर्णपणे रंगवलेलं होतं. अजूनही त्याचे अवशेष आपल्याला दिसतात.

वराहनं आपल्या हातात भूदेवीला उचलल्याचं शिल्प अतिशय प्रमाण, सुंदर आणि आकर्षक आहे. या वराह लेणीच्या मागं, एक लाइटहाउस आपल्या नजरेस पडतं. ते ब्रिटिशांच्या काळात उभारण्यात आलं असलं, तरीही त्याच्याखाली पल्लवकालीन लेणी आपल्याला आढळतात. हे सगळं काही एकाच ठिकाणी, थोड्याफार फरकाचं अंतर ठेवून खोदण्यात आलं आहे. पाच रथ आणि इतर सर्व लेणी पाहायला आपल्याला कमीत कमी चारपाच तास निवांत हवेत.

महाबलीपुरमच्या समुद्रकिनाऱ्यावर एक अतिशय सुंदर मंदिर पल्लावांच्या काळात उभारण्यात आलंय. भौगोलिक स्थानामुळं या मंदिराला ‘Sea Shore’ किंवा शोर मंदिर म्हणून ओळखतात. या मंदिराच्या गर्भगृहात सोमस्कंदाची प्रतिमा आहे. शिव, पार्वती आणि कार्तिकेयच्या एकत्रित प्रतिमेला सोमस्कंद या नावानं ओळखण्यात येतं. मंदिराच्या बाहेर सिंहारूढ दुर्गा विराजमान आहे. सिंह हा पल्लावांच्या स्थापत्यातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे.

नरसिंहवर्मन किंवा राजसिंहवर्मन यांच्या काळातील बांधकाम ओळखायला फार भारी सोय या दोघांनीच करून ठेवली आहे. ज्या मंदिर किंवा लेण्यातील खांबांच्या पायामध्ये बसलेल्या सिंहाचं शिल्प असेल तर ते नरसिंहवर्मनच्या काळातील आणि जर दोन पायांवर उभारलेला सिंह असेल, तर ती वास्तू राजसिंहवर्मनच्या काळातील आहे हे स्पष्टपणानं ओळखता येतं आणि मुख्यतः सर्व बांधीव मंदिरांची उभारणी ही राजसिंहवर्मनच्या काळात झाली आहे.

नरसिंहवर्मन पल्लवांच्या घराण्यातील फार ताकदवान राजा होऊन गेला. त्याचे वडील, महेंद्रवर्मन उत्तम नाटककार होते. स्वतःला ‘विचित्र चित्त’ या नावाने तो संबोधत असे. नरसिंह ऊर्फ मामल्लने बदामीवर आक्रमण केलं आणि पुलकेशी दुसरा चालुक्य याला हरवलं. पुलकेशी दुसरा दख्खन भागात होऊन गेलेला बलाढ्य राजा होता. कांचीवर आक्रमण करणं, आपल्या वडिलांना हरवणं यांसारख्या गोष्टींमुळे मामल्ल दुखावला गेला होता. त्यानं बदामीवर हल्ला केला, पुलकेशीला हरवलं आणि स्वतःला ‘वातापीकोंड’ अशी पदवी धारण केली.

कांचीपुरम, चेन्नई आणि पुदुचेरी या तिन्ही प्रसिद्ध स्थळांपासून महाबलीपुरम दीड-एक तासांच्या अंतरावर आहे. चौदाशे वर्ष जुन्या या गावामध्ये पल्लवांच्या वैभवशाली साम्राज्याच्या पाऊलखुणा सर्वत्र विखुरलेल्या आहेत. त्या पाहायला आणि तो इतिहास जगायला एकदातरी जायला हवं.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

बुद्धकालीन चित्र-शिल्प-कलासंस्कृती

सकाळ वृत्तसेवा

- प्रसाद पवार

शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीत आदी कालमानानुसार विकसित झालेल्या कला. यांत प्रामुख्यानं भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व दिसून येतं. या सर्व कला आजही सादर केल्या जातात तेव्हा त्यांचा ताल-सूर-रंग-आकार-लय यांतून भारतीय संस्कृतीचा आशय व महानता प्रकट होते.

चित्र आणि शिल्प या कलाकृती आपण बघत असताना त्यांमधली अनेक सौंदर्यस्थळं, अनेक कलात्मक मूल्यं आदींची चर्चा केली जाते. अशा सौंदर्यस्थळांचं, कलात्मक मूल्यांचं विश्लेषण केली जातं. मतं प्रकट केली जातात व मग ती कलाकृती कलाकृती म्हणून स्वीकारली जाते.

मुळात एखादी कलाकृती - उदाहरणार्थ : चित्र आणि शिल्प- कशा पद्धतीनं अभिव्यक्त केली जाते यासंदर्भात विचार केला तर असं लक्षात येतं की, प्रत्येक चित्राची-शिल्पाची निर्मिती ही विशिष्ट कलात्मक दृष्टिकोनातून केलेली असते.

आपल्याला एखादं चित्र आवडतं आणि ते सुंदर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात असं नेमकं काय असतं की ज्यामुळे ते आपल्याला आकर्षित करतं...आनंदित करतं...समाधान देतं? त्या कलाकृतीशी आपण नकळतपणे कोणत्या घटकांमुळं जोडले जातो?

हे जाणून घेण्यासाठी, कला कशी बघावी, कलेत नेमकं काय शोधावं, कला कशा पद्धतीनं समजून घ्यावी, कलाकृती निर्माण करण्यामागचा चित्रकाराचा-शिल्पकाराचा उद्देश काय आहे...अशा अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात.

आणि, ही कलाकृती ज्या ठिकाणी स्थापित करायची आहे त्या परिसरातलं साजेसं वातावरण हाही पैलू लक्षात घेऊन त्यावर विचार करावा लागतो. बुद्धकालीन कलानिर्मितीत ‘भारतीय संस्कृती’ प्रकर्षानं जाणवते; कारण, साहित्यातली संस्कृती ही ‘सांस्कृतिक पुरावा’ म्हणून अभ्यासली जात असली तरी तीतून निर्माण होणारी व्हिज्युअल्स ही साहित्य अभ्यासणाऱ्या व्यक्तीच्या माहितीवर-ज्ञानावर आधारित असतात व हे आभासी चित्रण हे इतरांसाठी व्यक्त करताना पुन्हा शब्दांचा आधार घ्यावा लागतो;

म्हणजेच, साहित्यात अनेक शब्दांचा आधार घेऊन निर्माण होणारा आशय हा चित्र-शिल्प या माध्यमांतून अधिक उत्तमरीत्या समूहासमोर मांडता येतो. चित्र-शिल्प यांना स्वतःची एक भाषा असल्यामुळे कुठलाही शब्द न उच्चारतादेखील कलाकृतीचा आशय व्यक्त होणारी भावना ही सर्वांपर्यंत एकसारखीच, एकाच तीव्रतेची आपल्याला पोहोचवता येऊ शकते.

कदाचित् जगभरात भाषा वेगवेगळ्या असतील; पण एकाच भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या दोन व्यक्ती जोपर्यंत समोरासमोर येऊन संवाद साधत नाहीच तोपर्यंत भाषेच्या माध्यमातून विचारप्रकटन शक्य होत नाही; परंतु चित्र व शिल्प या माध्यमांतून सभोवतालचं वातावरण, वेगवेगळे आकार, रंग, समाजजीवन घडणारी घटना, प्रबोधन किंवा एखादी अंतरंगातली माहिती आपण आकारमानासह दर्शकांसमोर ठेवू शकतो व त्यावर संवाद साधता येऊ शकतो.

एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर घडत असते. त्या घटिताला आपण वर्तमान म्हणतो. आणि, जी घटना काही क्षण अगोदर घडली तर...काही वर्षं अगोदर घडली तर... काही तपं अगोदर घडली तर आपण त्याला भूतकाळ म्हणतो. खरं तर भूतकाळ, व भूतकाळातल्या घटना यांना आपण इतिहास असं संबोधतो.

हजारो वर्षांपूर्वी घडून गेलेल्या या सर्व घटना आज आपण जेव्हा वर्तमानामध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण खरं तर इतिहास समजून घेत असतो व त्याबरोबरच त्या काळातली - आपण प्रत्यक्ष बघत नसलेली एखादी घटना - जी घडून गेली आहे, तिचा मागोवा घेत असतो. हा झाला प्राथमिक भाग; परंतु या भूतकाळातले इतिहासामधले प्रसंग जेव्हा आपल्यासमोर प्रतिमेतून दिसतात तेव्हा मात्र इतिहास आपल्याशी बोलायला लागतो; कारण, त्या काळी सर्व घटना प्रत्यक्ष घडत असताना जशा दिसत असू शकतील तशाच प्रकारची चित्र-शिल्पनिर्मिती केली गेलेली असते.

आधुनिक जगात प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाणशीर मोजमाप तयार होत गेलं. त्यानुसार चित्र-शिल्प-सौंदर्यशास्त्र यांच्यासाठीही अनेक परिमाणं, मोजमापं, गणितं आली. या आधुनिक मापदंडांचा निकष लावला तर अनेक चित्र-शिल्प आपल्याला अद्भुत आनंद देतात, असं लक्षात येईल. म्हणजे, गेल्या चारशे वर्षांत चित्र-सौंदर्यशास्त्र व शिल्प-सौंदर्यशास्त्र ज्या निकषांनुसार निर्माण केलं, त्या निकषांचा व प्रमाणांचा जगभरात प्रसार झाला व ते प्रमाण कलाकृती निर्माण करताना गृहीत धरलं गेलं. परिणामी, जगभरात चित्रनिर्मिती आणि शिल्पनिर्मिती यांमध्ये अनेक सौंदर्यमूल्यं निर्माण झाली.

भारतीय संस्कृती ही विविध प्रकारच्या ग्रंथांमध्ये ग्रथित झालेली आहे. त्या ग्रंथांमधून ती आपल्यापर्यंत पोहोचते. यामध्ये अगदी, हस्ताक्षर कसं असावं इथपासून ते चित्र व शिल्पनिर्मिती करताना कुठल्या कुठल्या विषयांचा विचार करावा, कोणती सौंदर्यमूल्यं जपावीत यांसारख्या विषयावर विस्तृत साहित्य आहे.

रेषा-रेषासौंदर्य-आकार-रंग-रंगशास्त्र-मानवी आकार व त्यांची प्रमाणबद्धता- निसर्ग-पानं-झाडं-फुलं आदी अनेक विषयांवरचं लेखन उपलब्ध आहे व या साहित्यातल्या वर्णनानुसार विविध प्रकारची चित्र-शिल्पनिर्मिती भारतभर बघायला मिळते.

चारशे वर्षांपूर्वी जगभरात चित्र व शिल्पनिर्मिती करताना उत्तम सौंदर्याचं जे काही मूल्यमापन झालं त्यानुसार तयार केलेल्या रचना आजही अबाधित आहेत. असं असतानाही मला दोन हजार वर्षांपूर्वी भारतभर ज्या स्मारकांची निर्मिती झाली, ज्या गुहांची व मंदिरांची निर्मिती झाली, त्यांच्याकडं चिकित्सक नजरेनं पाहता असं लक्षात येतं की, भारतीय कलाकारांनी त्या काळी केलेलं काम हे मुळातच आधुनिक सौंदर्यशास्त्राचा वापर करूनच केलेलं आहे.

प्रत्येक जण नवनिर्मिती करत असतो. या नवनिर्मितीत काहीतरी वेगळं, नियमांपेक्षा अमूर्त अशा स्वरूपाच्या कल्पना प्रत्यक्षात उतरताना आपल्याला दिसतात; परंतु भारतीय चित्र आणि शिल्प या कला ही प्रामुख्यानं सांस्कृतिक प्रतीकं आहेत. या सर्व कलांमधून संस्कृतीची झलक पाहायला मिळते व ही संस्कृती दोन ते पाच हजार वर्षांपासून आपल्याला सौंदर्यातल्या महत्त्वाच्या रचना प्रदान करत आहे.

अगदी सिंधुसंस्कृतीतली धातुशिल्पं आणि मातीतल्या रचना जर पाहिल्या तर, मला असं वाटतं की, त्या काळाच्या तुलनेनं आज आपण फार मोठा टप्पा गाठला असं वाटत नाही; कारण, कठीण दगडातही मुलायम सौंदर्य निर्माण करण्यात हजारो वर्षांपूर्वीचे भारतीय कलाकार नक्कीच यशस्वी झालेले आहेत.

दगडातही ताल आणि सूर यासंदर्भातले आवाज यशस्वीरीत्या निर्माण करून आजही आपल्यासमोर तशा निर्मितीचं मोठं आव्हान उभं आहे. पूर्वीच्या काळातली दगडातली एखादी प्रतिमा अगदी जिवंत व्यक्तीसारख्या संवेदना प्रकट करते असं वाटतं, तसंच दगडात विशिष्ट जाडीचा आकार कोरून त्यातून संगीताचा नाद तयार करण्यात आपले पूर्वज नक्कीच यशस्वी झाले होते.

आपण सर्व भारतीय या चित्र-शिल्प निर्मितीतल्या प्राचीन बौद्धिक संपदेचा जन्मातःच अधिकार असलेले कलाकार आहोत व त्यामुळे या बौद्धिक संपदेचा वापर करून आधुनिक तंत्रात ‘सांस्कृतिक आशय’ अधिकाधिक प्रकट व्हायला हवा.

भारतीय संस्कृती, कलासंपदा ही जागतिक स्तरावर सॉफ्ट पॉवर समजली जाते. ही सॉफ्ट पॉवर आपण जास्तीत जास्त वापरायला हवी; जेणेकरून आपल्या कलाकृतीतून भारतीय संस्कृती प्रकट होईल व आपण जी कलात्मक निर्मिती केली आहे ती भारतीय संस्कृतीची ठेव म्हणून जपली जाईल. त्यासाठी अधिकाधिक उत्तम चित्र-शिल्पनिर्मिती होणं आवश्यक आहे.

(लेखक हे रिसर्च फोटोग्राफर व रिस्टोरेशन आर्टिस्ट, तसंच अजिंठा कलासंस्कृतीचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाच्या ‘सांस्कृतिक धोरण समिती’चे सदस्य आहेत.)

राजवंश भारती : नागवंश

सकाळ डिजिटल टीम

लेखक : ॲड. सुशील अत्रे

अगदी प्राचीन काळापासून नागवंश अस्तित्वात आहे. त्यांची राज्ये लहान व विखुरलेली होती, पण ती प्रत्येक कालखंडात होती. नागवंश (Naga dynasty) भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. नागांचे पुसटसे उल्लेख वेदांमध्ये आढळतात;

पण नागवंशाबद्दल ठळक उल्लेख आढळतो, तो महाभारतात. अगदी आजही भारताच्या ईशान्येकडे नागांचा एक प्रदेश, नागप्रदेश ‘नागालँड’ नकाशात विद्यमान आहे. नागवंशीय राजांनी पौराणिक काळात विदिशा, मथुरा, पद्मावती या ठिकाणांहून आपला राज्यकारभार केला. (nashik saptarang latest article on Naga dynasty marathi news)

नागवंश हा असा राजवंश आहे, जो अगदी प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात होता. नागांचे पुसटसे उल्लेख वेदांमध्ये आढळतात; पण नागवंशाबद्दल ठळक उल्लेख आढळतो तो महाभारतात. असे दिसते, की सूर्यवंश व चंद्रवंश या दोन्ही प्राचीन वंशांच्या जोडीने नागवंशाची लहान-मोठी राज्ये भारतवर्षात नांदत होती.

पण त्यांचे प्रदेश बहुधा मुख्य राजप्रदेशांपासून दूर, एकीकडे असे होते. शिवाय इतर क्षत्रिय वंशांच्या मानाने नागवंशीराजे अर्धनागरी समजले जात. त्यांच्याविषयी एक प्रकारची भीती आणि परकेपणाची भावना तत्कालीन राजकुळांमध्ये होती. नाग किंवा निषादांचे राज्य जोपर्यंत आडबाजूला होते, तोपर्यंत मोठ्या राजसत्तांना काही आक्षेप नव्हता.

पण त्यांचे वर्चस्व वाढत आहे, अशी शंका आली, की या राजांना ती धोक्याची घंटा वाटायची. मग कोणतेही निमित्त काढून मोठ्या राजसत्ता नागांशी युद्धाला सुरवात करीत. नागवंशी लोक मुळात अत्यंत शूर आणि लढवय्ये होते, पण साधनसामग्रीबाबत ते क्षत्रिय राजांपेक्षा बरेच उणे होते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला, असे दिसून येते.

याशिवाय आणखी एक महत्त्वाची उणीव त्यांच्यात होती; ती म्हणजे शिक्षणाची. कोणत्याही महत्त्वाच्या घटनेची नोंद त्या काळी बहुधा मौखिक परंपरेने ठेवली जायची. ती कथारूपात, श्लोकबद्ध करून, पाठांतराने प्रसारित होत असे; जसे महाभारत व्यासशिष्यांनी सर्वज्ञात केले.

त्यामुळे नोंदवणारी व्यक्ती ही मुळातच या मोठ्या राजवंशांशी निगडित असलेली, त्यांची नोंद पक्षपाती अशीच असणार हे उघड आहे. म्हणूनच नागवंशाच्या राजांचे उल्लेख जे प्राचीन वाङ्मयात आहेत, ते तुटक आणि अपुरे आहेत. त्यांची एक सलग अशी वंशावळ सापडतच नाही आणि त्यांचे जे चित्रण केले गेले आहे, तेही अगदी चमत्कारिक, अतिरूपकात्मक आहे.

नागांविषयी बोलताना ते जणू प्रत्यक्ष सर्पयोनीतील अजस्र जीव होते, अशी वर्णनेच जास्त आहेत. विविध शापांच्या गुंतावळ्यात त्यांना अडकवून अतिमानवी योनीत टाकून दिले आहे. परिणामी, या कथांमागची रूपके समजून घेऊन त्यातून इतिहास शोधणे फार जिकिरीचे होते. (Latest Marathi News)

अशा रूपकांच्या गुंत्यातून नाग या राजवंशाची जी थोडीफार माहिती समजते ती अशी : महर्षी कश्यपांना कद्रू या पत्नीपासून जी मुले झाली, त्यांच्यापैकी महत्त्वाचे म्हणजे अनंत (शेष), वासुकी, तक्षक, कर्कोटक, कालिया, पद्म, शंख, कुलिक, धृतराष्ट्र, ऐरावत (ही नागांचीच नावे आहेत) इत्यादी.

कद्रू ही विनतेची बहीण आणि दक्षप्रजापतीची मुलगी असल्याचे पुराणांमध्ये म्हटले आहे. पण, ती स्वत: नागपूजक वनवासी समाजाची असावी किंवा तिने तशी पूजापद्धती अंगीकारली असावी. तिने आपल्या मुलांना ‘नागवंशी’ ही ओळख दिली. त्यांनीही तीच ओळख भविष्यात कायम ठेवली. तशी नागकुळे कितीतरी आहेत; पण आपण सध्या ‘नाग’ या राजवंशाचा विचार करतोय.

कश्यपांनी जो भूभाग रहिवासयोग्य केला, त्याला कश्यपांचा प्रदेश- ‘कश्यपमीर’ हे नाव मिळाले. ते आजचे काश्मीर. इथेच त्यांच्या मुलाने अनंताने आपली नगरी वसविली ती अनंतनाग. अनंताला ‘शेष’ या नावानेही ओळखले जाते. हा पौराणिक नागवंशातील बहुधा पहिला आणि सगळ्यात श्रेष्ठ राजा होय. दुसरा कद्रूपुत्र वासुकी. त्यानेही त्याच भागात हिमालयाच्या पायथ्याला आपले नागराज्य उभे

केले. कर्कोटकानेही काश्मीर प्रदेशातच राज्य केले. त्याचा वंश जास्त काळ टिकला. इसवी सनाच्या आठव्या शतकातील काश्मीरचा प्रसिद्ध राजा ‘ललितादित्य मुक्तापीड’ हा कर्कोटक वंशाचाच राजा होता. कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथामध्ये याची सविस्तर माहिती आहे.

तक्षक थोडा दक्षिणेकडे सरकला. पंचनद प्रदेशात तक्षकशिलेला त्याने आपले राज्य स्थापन केले. कालियाने पूर्वेकडे, यमुनेच्या आसपास आपली वस्ती हलवली. तक्षक आणि कालिया यांनी महत्त्वाकांक्षेपोटी चंद्रवंशाशी वैर पत्करले. त्याचा परिणाम असा झाला, की यदुवंशी श्रीकृष्णाने कालियाला यमुनेपासून हाकलून लावले. (Latest Marathi News)

तिकडे खांडववन अर्जुनाने जाळले, तेव्हा त्यात प्रच्छन्नपणे राहणारी तक्षकपत्नी आणि अनेक नागसेवक मारले गेले. साहजिकच तक्षकाने पांडवांशी वैर धरले. ते अनेक वर्षे टिकले. महाभारत युद्धानंतर त्याने परिक्षित राजाला (बहुधा विषप्रयोगाने) मारले. त्याचा सूड जनमेजयाने घेतला आणि त्याने सगळ्या नागवंशाविरुद्ध युद्ध पुकारले.

तक्षक देवांच्या राजाला इंद्राला शरण गेला. अखेर आस्तिक या एका नागमातेच्या ब्राह्मणपुत्राने या सूडयज्ञात मध्यस्थी करून समेट घडवून आणला. या वैरभावाच्या विपरीत जाऊन अर्जुनाने वनवासात असताना कौरव्य नागवंशाची राजकन्या उलूपी हिच्याशी गांधर्व विवाह केला. त्यांचा मुलगा इरावान, महाभारत युद्धात पांडवसेनेत होता. नागवंशीय राजांनी पौराणिक काळात विदिशा, मथुरा, पद्मावती या ठिकाणांहून राज्यकारभार केला.

इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात सातवाहन राजा सीमूत याची राणी ‘नागनिका’ ही नागवंशीय होती. स्वत:च्या नावाची नाणी पाडणारी आणि शिलालेख कोरून घेणारी ती इतिहासातील पहिली महिला राज्यकर्ती होती आणि हा मान नागवंशाला जातो! नागवंशीय राजांनी भारताच्या मध्यावर स्थापन केलेली नगरी त्यांच्या नावानेच ओळखली जाते, ती म्हणजे नागपूर!

दक्षिणेतील पांड्य राजवटीची पाळेमुळेही नागवंशात आहेत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हिंदू पुराणांव्यतिरिक्त बौद्ध जातके आणि जैन पुराणांमध्येही नागराजांचा संदर्भ आढळतो. आपल्या अजिंठा लेण्यांमध्ये नागराजाचे एक सुरेख शिल्प कोरलेले आहे.

अशा प्रकारे अगदी प्राचीन काळापासून नागवंश अस्तित्वात आहे. त्यांची राज्ये लहान व विखुरलेली होती, पण ती प्रत्येक कालखंडात होती. नागवंश हा भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. अगदी आजही भारताच्या ईशान्येकडे नागांचा एक प्रदेश, नागप्रदेश ‘नागालँड’ नकाशात विद्यमान आहे. 

जैनकला

विजय टिपुगडे

भारतीय समाजरचनेत विविध धर्म, संप्रदाय आढळतात. प्रत्येक धर्माची वैशिष्ट्यं, विचारसरणी वेगवेगळी असली तरी सांस्कृतिक मूल्ये प्रत्येक धर्मानं जपलेली आहेत. जैन धर्म हा त्यांपैकीच एक. या धर्मानं भारतीय कला आणि स्थापत्यशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. ‘धर्मपरिवार’ या संकल्पनेची धर्मवैशिष्ट्यं त्यांच्या कलेत दिसून येतात.

सर्वसाधारणपणे भारतीय जैनकला ही बौद्ध आणि हिंदू कलेच्या समकालीन शैलीशी मिळतीजुळती आहे; परंतु ती बहुतकरून मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्यकला यांमध्ये विशेषत्वानं प्रतिबिंबित होताना दिसते.

वास्तू, शिल्प व चित्र यांच्या बाबतीत इतर प्रस्थापित कल्पनांचा-कलापरंपरांचा, प्रामुख्यानं बौद्ध कल्पनांचा व कलापरंपरांचा, प्रभाव सुरुवातीला जैनकलेवर होता; परंतु आकार व घडण यांबाबतीत जैनकलेनं दाखवलेल्या खास वैशिष्ट्यांमुळे या निर्मितीला शैलीदृष्ट्या महत्त्व आलं. जैनकलेत तीर्थंकर अथवा त्यांच्या इतर अनुयायांचा ध्यानमुद्रेतला - यक्ष आणि यक्षिणी यांच्यासमवेतचा अथवा तीर्थंकरांचे रक्षक आदींचा - समूह दर्शवलेला आढळतो.

जैनकलेची वैशिष्ट्यं दर्शवणारी काही उदाहरणं अशी : सुपार्श्वनाथ तीर्थंकरांच्या चेहऱ्यावर अहिंसा, शांतता दर्शवणारे भाव आढळतात, तसंच मूर्तीची वेशभूषा, केशरचना, धर्मचिन्हं, मस्तकी सर्पमुकुट आदी वैशिष्ट्यांचा उल्लेख करावा लागेल. दिगंबर-मूर्तीमध्ये साधारणतः प्रतीकात्मक वेशभूषा नग्न आणि आलंकरण नसलेली असते.

श्वेतांबरपंथीय प्रतिमा तात्पुरत्या आलंकरणांनी सजवलेल्या, छातीवर कोरलेलं ‘श्रीवत्स’, तसंच कपाळावर तिलक असणाऱ्या अशा आहेत. कधी श्रीवत्स अष्टमंगल असलेलंही आढळतं. भगवान महावीरांच्या निर्वाणानंतर तीर्थंकर व धर्मपीठाचं स्वामित्व करणारे स्थविर यांच्या समाधींवर स्तूप बांधण्यात आले. नंतर शिल्पांनी व भित्तिचित्रांनी युक्त अशी लेणी व कालांतरानं शिखरमंदिरांचे समूह अशी वास्तुनिर्मिती झाली.

मंदिरांच्या पायांचे आराखडे देवतानिर्दशक अशा ‘यंत्र’ आकृतींवर आधारलेले असत. वास्तूंच्या पायथ्याशी असणारे आराखडे यंत्रात्मक असणं हादेखील प्रस्थापित विचारसरणीचाच प्रभाव मानता येईल. मंदिरातली तीर्थंकर मूर्ती ही उभी (कायोत्सर्ग) अथवा योगासनात बसलेली असते. सिंहासनावर धर्मचक्र व मूर्तीच्या हृदयस्थानी चिंतामणी असतो. चिंतामणी आदी चिन्हांशिवाय मूर्तीला पूर्णत्व येत नाही.

असे काही धार्मिक आदेश शिल्प-चित्र घडवताना पाळले जातात. मंदिरासमोर मानस्तंभ उभा केला जातो. त्यामध्ये चार दिशांना चार तीर्थंकरांच्या मूर्ती अशी रचना केलेली पाहायला मिळते. तीर्थंकरांच्या सिद्धायिका, चक्रेश्वरी, अंबिका, पद्मावती आदी शासनदेवता, तसंच ‘नंदीश्वरद्वीप’ (पृथ्वीवरील स्वर्ग) वगैरे पवित्र धर्मप्रतीकं जैनलेण्यांमधल्या व मंदिरांमधल्या शिल्पांत साकारलेली आहेत.

सर्वांत जुन्या जैन वास्तू सोनभांडार (बिहार, इसवीसनपूर्व ५७) आणि उदयगिरी इथल्या होत, तसंच सौराष्ट्र, सित्तनवासल, ऐहोळे, बदामी, वेरुळलेणी (३० ते ३४), खजुराहो, ग्वाल्हेर, केरळ, राजपूताना, गुजरात अशा भारतातल्या सर्वच ठिकाणी जैन-अवशेष विखुरलेले आहेत. हे सर्व अवशेष इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंतचे आहेत, असं तज्ज्ञांनी नमूद केलेल्या कागदपत्रांवरून आढळतं.

श्रवणबेळगोळ इथली गोमटेश्वराची (बाहुबली) प्रचंड आकारातली मूर्ती, दिलबाडा-जैसलमेर इथली संगमरवरी वास्तू व शिल्पं अशी अनेक जैनश्रद्धास्थानं त्यांच्या निर्मितीतल्या अपूर्वतेमुळे कलेतली सौंदर्यस्थानं ठरली आहेत. या वास्तूंचं व मूर्तींचं प्रादेशिक व कालपरत्वे शैलींशी फार निकटचं नातं असलं तरी त्यांत जैनपरंपरेला अनुसरून ‘सत्त्वभाव’ महत्त्वपूर्ण असून, त्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. कालखंडानुसार विचार करता, काही महत्त्वाचे टप्पे संशोधनातून समोर येतात.

कालखंड एक (इसवीसनपूर्व ३०० ते इसवीसन १००) : जैनस्मारकातल्या (मंदिरातल्या) शिल्पकलेच्या निरुपणाच्या दृष्टीनं जैनवैशिष्ट्यांचा साधारणतः अभाव आहे; दगडात कोरलेल्या काही मूर्ती या जैन असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातो, तर काही मूर्ती लाकडापासून तयार केलेल्या होत्या, ज्यांचे काही नमुने अस्तित्वात आहेत. सिंधू संस्कृतीतली नग्न-योगमुद्रावस्थेत असणारी ‘मुद्रा’ (इसवीसनपूर्व २५००) जैनधर्मीय असावी. लहानीपूरमध्ये आढळणारं कबंधशिल्प प्राचीन आहे (पाटणा इथल्या संग्रहालय ते पाहायला मिळतं), तेविसाव्या तीर्थंकरांच्या काही ‘पार्श्व’प्रतिमा-कलाकृती मुंबईत ‘छत्रपती शिवाजीमहाराज संग्रहालय’ इथं आहेत.

कालखंड दोन (इसवीसन १०० ते इसवीसन ५५०) : उत्तर भारतातली जैनकला आणि मूर्तिशास्त्र यांत विशिष्ट असा बदल झाला.

कालखंड तीन (इसवीसन ५५० ते ७५०) : हा प्रयोगांचा आणि प्रात्यक्षिकांचा कालावधी मानला जातो. पटैनी, मध्य प्रदेशात गुप्तकाळात निर्मिलेल्या प्रतिमा, तसंच चंदनाच्या लाकडात कोरलेली जैन तीर्थंकरांची शिल्पं आणि काही ब्राँझ प्रतिमा आढळून येतात.

कालखंड चार (इसवी ७५० ते १२००) : विविध प्रादेशिक जैनप्रतिमांची निर्मिती या काळात झाली. यांत देवी-देवतांच्या असंख्य कलाकृती आढळतात. हंसी इथं आढळून आलेल्या ५८ ब्राँझप्रतिमा या जैन तीर्थंकरांच्या आहेत, तर असीगड किल्ला हा दिगंबर-श्वेतांबर पंथ यांच्या समकालीन संस्कृतीतून निर्मिला गेलेला आहे.

कालखंड पाच (इसवीसन १२०० ते १५००) : पश्चिम भारतातली श्वेतांबरकला (शिल्प आणि लघुचित्रकला) पूर्णपणे विकसित स्वरूपात आढळते. जैन (Rock-cut) स्थापत्याचं दर्शन वेरुळलेणी (महाराष्ट्र), दिलवाडा (माऊंट अबू,राजस्थान), जैनबस्ती (कर्नाटक) इत्यादी अनेक उदाहरणांतून दिसून येतं.

‘सोळंकी आणि मारू-गुर्जर’ शैलीतल्या स्थापत्याचा अधिक प्रभाव पश्चिम भारतात साधारणतः दहाव्या शतकाच्या आसपास दिसून येतो.

माणसाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी अहिंसेची मूल्ये पेरणाऱ्या जैन धर्माच्या अंतरंगात अनेक सुंदर रहस्यं दडलेली आहेत.











No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...