कलेची सुरुवात कुठे झाली असे पाहायला गेल्यास लक्षात येते की, अन्य वनचरांप्रमाणे मानवही मिळेल ते खात होता. एवढेच नाही तर इतर सर्व प्राण्यांमध्ये तो शिकारीच्या दृष्टीने निर्बुद्ध आणि अकुशल होता. इतर प्राण्यांनी मारून खाऊन टाकलेले तो खात होता. किती शतके अशी गेली हे ठाऊक नाही. परंतु अनुभवाने त्याचा विकास झालेला दिसतो. कठोर कवचाच्या फळांना चिकटलेला गर हा अन्य दगडाने किंवा लाकडाच्या कपचीने खरडून काढता येतो असे त्याच्या लक्षात आले. आपल्याला हव्या असणाऱ्या आकाराच्या कपच्या उपलब्ध नसल्यास एका दगडावर दुसऱ्या दगडाने प्रहार करून मनाजोगता आकार देता येतो हे त्याला उमगले. पुढे पुढे आघात करायला कोणता दगड घ्यावा आणि आकार द्यायला, घडवायला कोणता दगड घ्यावा तसेच यांच्यातला टणकपणा वेगळा असतो ह्याचेही त्याला ज्ञान झाले. ज्या दिवशी पहिल्यांदा एक दगड उचलून त्याने दुसऱ्या दगडावर घाव घालायचा प्रयत्न केला असेल त्या दिवशी जगातला पहिला कलाकार जन्माला आला. जगामध्ये अनेक मानव समूहांमध्ये अशीच सुरुवात झाली असणार. परंतु असे आढळले आहे की, भारतामध्ये आढळलेल्या या कलेचे नैपुण्यही थोडे उजवेच होते असे म्हणावे लागेल. पाषाण युगातील आफ्रिका खंडात सापडणाऱ्या दगडी हत्यारांपेक्षा समकालीन भारतात सापडलेली हत्यारे ही कित्येक पटीने रेखीव आणि धाटणीमध्ये उत्कृष्ट अशी आढळलेली आहेत.
असाच एक मानव समूह स्थलांतर करीत करीत (आजच्या मध्य प्रदेश या प्रांतात ) नर्मदा नदीपासून दूर थोड्या उंच अशा डोंगराळ प्रदेशात पोहोचला. इथले वातावरण अत्यंत वेगळे होते.प्रचंड अशा वालुकापाषाणाच्या शिळांमध्ये नैसर्गिकरीत्या मोठ्या खोबणी तयार झालेल्या त्यांना आढळल्या. एक आयता आडोसा आणि तोही इतका भक्कम त्यामुळे त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. हेच या विशेष समूहांबाबत जे घडले ते जगामध्ये आदिम काळात अन्यत्र कधी घडले नव्हते ओणि त्यानंतरही तसे कुठेही घडले नाही. अश्मयुगात साधारणतः काही दशके किंवा एक दोन शतके एवढ्यास ३ कालखंडात एखादी वस्ती केल्याचे आढळून येते. फार तर क्वचित प्रसंगी एक दोन सहस्रके. इथे मात्र सलग एक लाख वर्षांहून अधिक काळापर्यंत वस्ती असल्याचे अवशेष सापडलेले आहेत. होत.
खरं तर हेही एवढे जुने आहे आणि तेही भारतात याच्यावर आधुनिक काळात कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. १८६८ मध्ये किंकेड नावाचा इंग्रज अधिकारी सर्वेक्षणाच्या निमित्ताने तिथे गेला. त्याने तिथल्या भिंतींवरील असणाऱ्या काही चित्रांचीही नोंद केली, परंतु तसल्याच प्रकारच्या चित्राकृती त्याला जवळपासच्या वनात राहणाऱ्यांच्या घरावर पण दिसल्या असाव्यात. यामुळे याच मंडळींनी गुरे चारता चारता डोंगरावरील गुफांमध्येही त्या चितारल्या असाव्यात असा समज त्याने करून घेतला. त्यातील काही आकृत्यांमध्ये गेंड्याच्या शिकारीचे चित्र होते, ते पाहून विसाव्या शतकाच्या पूर्वाधात होऊन गेलेल्या गार्डन नावाच्या संशोधकाने त्या चित्रांचा काळ केवळ तीनशे वर्षांपूर्वीचा असावा असे ठोकून दिले. त्याचे समर्थन करण्यासाठी बाबरला गेंड्याच्या शिकारीचा नाद होता, त्यामुळे ही चित्रकला बाबरच्या काळातील असावी असा जावई शोधही त्याने लावून टाकला.
१९५८ मध्ये एक प्रवासी घाईघाईने भोपाळच्या रेल्वेस्थानकावर गाडी पकडण्यासाठी आला. त्याला नागपूरला जायचे होते. गाडी सुटल्यावर सुमारे पाऊण तासाने त्याने खिडकीबाहेर पाहिले तेव्हा त्याला एका डोंगरावर बेड्यावाकड्या आकारांच्या काही प्रचंड शिळा दिसल्या. कुतूहलापोटी त्याने सहप्रवाशाला विचारले, की हे काय आहे. त्यावर तो उत्तरला माहीत नाही नक्की काय आहे ते, परंतु तेथे काही खूप प्राचीन काळातल्या गुहा आहेत असे म्हणतात. गाडी वेगाने पुढे धावत होती आणि ह्या प्रवाशाची नजर दूरदूर जाणाऱ्या त्या शिळांवरून हालत नव्हती. त्याने पुन्हा शेजाऱ्याला विचारले की. पुढील स्टेशन कधी येईल त्यावर त्याने होशंगाबादपर्यंत गाडी कुठेही थांबणार नसल्याचे सांगितले.दहाच मिनिटांनी काही सहप्रवासी आपले सामान उचलून दाराकडे चालू लागले.
"अरे, तुम्ही तर म्हणालात की गाडी मध्ये थांबत नाही."
"हो ! ते खरं आहे. पण आमचे गाव इथेच जवळ आहे."
"पण तुम्ही उतरणार कसे?"
"काही नाही, पुढील स्थानकाच्या अलीकडे एक मोठे वळण असल्यामुळे गाडीचा वेग थोडा मंदावतो आणि आम्ही त्याच वेळेस पटापट उड्या मारतो. आम्हाला हे रोजचेच आहे."
याही प्रवाशाने घाईघाईने आपले सामान गोळा केले व त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. वळणावर गाडी हळू होताच त्यांच्या पाठोपाठ यानेही सामानासकट चालत्या गाडीतून स्वतःला झोकून दिले. सवयीचे नसल्यामुळे खाली पडताना अंग भरपूर खरचटले. त्याच अवस्थेत त्याने जवळच असणारे बरखेडा स्थानक गाठले. तिथून नागपूरला आपण येऊ शकत नाही अशी तार करून टाकली आणि त्या डोंगरावरील शिळांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. १५ ते २० मैलांचा तो प्रवास त्याने जंगलातून आणि काट्याकुट्यातून वाट काढत काढत केला आणि उन्हे उतरत असताना तो तिथे पोहोचला. अत्यंत निर्मनुष्य आणि घनदाट अरण्यात असणाऱ्या त्या शिळांखालील एका गुहेत एक साधू राहत असल्याचे त्याला दिसले. त्याने त्यास विचारले, "इस जगह का नाम क्या है ?"
साधू म्हणाला, "भीमबेटका."
"ऐसा क्यूं ?"
"ऐसा माना जाता है, इन शिलाऑपर भीम बैठा करता था। ये तो मानो कि भीम की बैठक है।"
त्या प्रवाशाने घरून आणलेला डबा साधूबरोबर संपवून रात्री तिथेच मुक्काम केला. सकाळी त्या जंगलातून वाट काढत शिळांमधील अन्य गुहांचा शोध घेतला. त्यात अनेक ठिकाणी भिंतीवर असंख्य चित्रे काढलेली दिसली. भारतीय चित्रकलेतल्या प्राचीनत्वाचा शोध घेण्याचा तो सोनियाचा दिवस उजाडला होता. त्या संशोधकाचे नाव आहे, विष्णू श्रीधर उपाख्य हरिभाऊ वाकणकर.

चित्र क्र. ४ : भीमबेटका येथील चित्रकला
पुढील पंधरा वर्षे एकट्याने अभ्यास करून आणि त्यावेळेस महिना केवळ चारशे रुपये असूनही शनिवार, रविवार आणि अन्य सुट्यांच्या दिवशी उज्जैन ते भोपाळ ते भीमबेटका असा प्रवास करून अविरत संशोधन सुरू ठेवले. ह्या संपूर्ण काळात हरिभाऊंची टिंगल आणि उपेक्षा त्यांच्या विक्रम विश्व विद्यालयातील सहकाऱ्यांनी केली. परंतु त्यांच्या अढळ विश्वासाने चालणाऱ्या या शोधयज्ञाची सांगता अखेर त्या चित्रांची प्राचीनता सिद्ध करूनच झाली. गॉर्डनच्या तर्क विसंगत विधानांचे समूह उच्चाटन केले गेले आणि बाबरचा काळ तर सोडाच पण यातील काही चित्रे ही सुमारे दहा हजार वर्षापूर्ण काढली गेली असावीत ह्या हरिभाऊंच्या शास्त्रशुद्ध निकषाला जगाने आज मान्यता दिली आहे.
हरिभाऊंच्या ह्या शोधामागे शास्त्रीय पुरावे, उत्खननातील पुरावे आणि इतर अनेक निकषांची हो जरी दिली गेली असली तरी खरा शोध हरिभाऊंनी लावला तो त्या आदिम काळातील आहे चित्रकारांच्या भावविश्वामध्ये प्रवेश करूनच. आपल्या भावभावनांचा आणि भोवतालच वातावरणाचा अत्यंत कल्पक आविष्कार त्या वेळच्या चित्रकारांनी आपल्याला इथल्या रेखाचित्रांमध केलेला दिसतो. अत्यंत ओबडधोबड अशा चित्रफलकावर (कॅनव्हासवर) तितक्याच ओबडधोब कुंचल्याने तो एकदाच टेकवून रेष पूर्ण करण्याच्या अटीवर साकारलेली ही अचाट चित्रकला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि तुटपुंजी आणि अपूर्ण साधने असून सुद्धा भावनात्मक गतिमानतेर साक्षात्कार घडवत जाण्याची ही प्रेरणा पुढील काळामध्ये भारतीय कलांची जणू ओळखच होऊन गेलं आहे. भारतीय कलांचे 'भीमबेटका' हे जणू तीर्थक्षेत्रच आहे.
भीमबेटका येथील चित्रांची प्राचीनता ठरविण्यासाठी त्या चित्रांच्या शैलींनुसार त्याचे पृथक्करण हरिभाऊंना करावेसे वाटले. ते स्वतःही उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांना त्यातील आधीच्या आरि नंतर विकसित होत गेलेल्या शैलीतील फरक कळला. भित्तीचित्रांच्या शैलींवरून त्यांची प्राचीनत आणि कालखंड ठरविण्याची ही अभिनव पद्धत हरिभाऊ वाकणकरांनी जगाला आणि पुरातत्त्वाला दिलेली एक देणगीच आहे.
स्पष्ट तरीही गूढ इतिहास
भीमबेटकामध्ये जरी दहा हजार वर्षांपासून ते सुमारे तीन हजार वर्षांपर्यंतच्या कालखंडात कलेमधला इतिहास सलगपणे दिसत असला तरीही, आपल्या देशातील अन्य कलांचा इतिहास तसा आढळत नाही. इ.स. पूर्व ५००० ते इ.स. पूर्व २००० या कालखंडातील अत्यंत प्रगत संस्कृतीच्या खुणा आणि अवशेष आपल्याला आढळतात. आधुनिक काळातील फर्माना, राखीगढी, खंबात य सारख्या स्थानांवरील उत्खननांमुळे हा कालखंड याच्याही तीन एक हजार वर्षे तरी मागे जातो. परंतु या सरस्वती-सिंधू संस्कृतीच्या पुराव्यांमध्ये त्यांच्या लिपीचे वाचन न होऊ शकल्यामुळे त्यालाही प्रागैतिहासिक काल असेच संबोधले जाते. या अवशेषांमध्ये मात्र अन्य कलांच्याबरोबरच शिल्पकलेचेही पुरावे मिळतात. या मध्ये घडवलेल्या दगडांच्या विविध आकारांपासून (Lathe-turned stones) ते पाषाण आणि धातू शिल्पित केलेली दिसतात. यातील प्रसिद्ध शिल्पे धोलाविरा (इ.स. पूर्व ३५००) येथील शिवलिंगासारखे लंबवर्तुळाकार दगड आणि सिंधू संस्कृतीतील (इ.स.पूर्व ३००० ते इ. स. पूर्व २०००) मोहेंजोदरो आणि हडप्पा येथे सापडलेली पाषाण शिल्पे आणि एका नर्तकीचे धातू शिल्प ही होत. पाषाण शिल्पामध्ये एक दाढीवाल्या पुरुषाचे अर्धशिल्प (Bust) सापडले आहे. त्याचा चेहरा तर अत्यंक सुबकपणे कोरलेला आहे, त्याचबरोबर त्याच्या खांद्यावरील शालीवरील नक्षीचा तपशीलही ठळकपणे दिसतो त्यावरून तो एक ज्येष्ठ पुजारी असावा किंवा धर्मगुरू असावा असा तर्क आहे. धातू शिल्पातील नर्तकी ही शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ, जाड ओठांची आणि विवस्त्र आहे. यामुळे अतिशय विकसित कलेच्या अवस्थेत असलेल्या या कलाकृतींचा हेतू मात्र स्पष्ट होत नाही. याच कालखंडातील अनेक आकारांची मातीची भांडी, रांजणे इ. अत्यंत उत्कृष्टपणे रंगवलेली आढळतात. याचा अर्थ त्या काळातील प्रयोगसिद्ध कला (Performing Art) आणि उपयुक्त कला (Applied Art) या एकाच वेळेस अत्यंत प्रगत आणि समृद्ध होत्या. तरीही त्यांचा हेतू हा नंतरच्या विकसित झालेल्या कलांशी साधर्म्य ठेवणारा नसल्यासारखा वाटतो. एकूणच आपल्या इतिहासातील हा कालखंड आणि त्या दरम्यान विकसित झालेल्या कल्पना, नगर रचना आणि समृद्धीच्या पाऊलखुणा या एका क्षणभर प्रदीप्त होणाऱ्या अग्निगोलाप्रमाणे आहेत. या संस्कृतीला समकालीन असणाऱ्या जगातील अन्य देशातील संस्कृती सुद्धा अशाच आणि इतक्याच प्रगत होत्या, सुमेरियन, इजिप्तियन आदी. परंतु त्याही तशाच क्षणभर चमकून नाहीशा झाल्या. सरस्वती आणि सिंधू नदीच्या खोऱ्यापासून पंजाब ते गुजरात आणि महाराष्ट्राचे उत्तर टोकापर्यंत पसरलेल्या या संस्कृतीचाही लोप झाला. हा भूप्रदेश भारतात असल्यामुळे आपण त्याला आपली संस्कृती असे मानतो. काही अभ्यासकांनी तर त्यात सापडलेल्या (Seals) मुद्रांवरील लिपी वाचताना त्या ऋग्वेदाच्याच ऋचा आहेत असेही म्हटले आहे. एका मुद्रेवरील प्राण्यांमध्ये बसलेल्या मानवी आकृतीला पशुपतिनाथही म्हटले आहे. खरे काय ते अजून अज्ञातच आहे. परंतु या कलांच्या काही शतकांनंतर विकसित झालेल्या हिंदू शिल्पकलेशी या परंपरेचा थेट संपर्क असावा असे मात्र दिसत नाही.पाश्चात्त्यांचे चमत्कारिक निकष
ऋग्वेदामधील ऋचांमध्ये अनेक विषयांचा समावेश आहे. ज्यामध्ये तत्कालीन घटनांचा परामर्श घेतलेला आहे. सर्व काही पाठ करून ठेवण्याची पद्धत असल्यामुळे कुठलेही पाल्हाळ न लावता कमीत कमी शब्दांमध्ये त्याची रचना करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यातील काही ऐतिहासिक घटनांचे वर्णन दोन दोन शब्दातच केलेले दिसते. ऋग्वेदांमधील दुसऱ्या मंडलातील अकरावे सूक्त गृत्समद-शौनकाचे
आहे. यातील प्रत्येक ऋचेच्या शेवटी 'जनास इंद्रः' असे शब्द येतात. म्हणूनच याला इंद्राचे पालुपद सूक्त असेही म्हणतात. शेवटल्या पालुपदाचा अर्थ "अरे अमुक अमुक करणारा तो इंद्र असा आहे" असा होतो. या सूक्तांमध्ये गृत्समद ऋषी एका ऐतिहासिक सत्याचा उल्लेख करून जातात. याची पार्श्वभूमी अशी आहे की, इंद्र हा वैदिक काळातील लोकांचा म्हणजेच आर्यांच्या सेनेचा सेनापती होता. तो ज्यांच्याकडून लढायचा त्यांना युद्धामध्ये विजय प्राप्त व्हावयाचा. त्याच्या रणांगणावरील असामान्य शौर्यामुळे इंद्राच्या काही दुर्गुणांकडे नुसता कानाडोळा केला जायचा एवढेच नाही त्याचा अनुचित लाभही घेतला जायचा. त्यामुळे अनेकदा शत्रुपक्षाचे लोक त्याचे अपहरण करून त्याला घेऊन जात, सोमरस पाजून तृप्त करत आणि त्यांच्या बाजूने लढण्यास उद्युक्त करत. अशाच एका सैन्याचा तो सेनापती होता की ज्या गावामध्ये गृत्समद ऋषी राहत होते. इंद्राचे अपहरण करायला रात्री शत्रू सैन्याचे लोक आले. तेव्हा गृत्समद ऋषींनी इंद्राची वस्त्र प्रावरणे आणि त्याचीच युद्धावर जाताना घालायची रक्षक वस्त्रे धारण केली. अपहरण करायला आलेल्या शत्रू सैन्यातील लोकांना तोच इंद्र वाटला आणि त्यांनी वेषांतर केलेल्या गृत्समद ऋषींना इंद्र समजून पकडून नेले. गृत्समद ऋषींचा बेत यशस्वी झाला आणि खरा इंद्र गावातच राहिला. शत्रूच्या छावणीच्या अगदी जवळ आल्यावर गृत्समद ऋर्षीनी बोलायला सुरुवात केली आणि त्या वेळेस त्यांनी जे त्या लोकांना सांगितले ते म्हणजे या अकराव्या सूक्तातील ऋचा आहेत. त्यात त्यांनी इंद्राचे वर्णन करताना त्याचे अनेक गुणविशेष सांगितले. प्रत्येक ऋचेमध्ये ते इंद्राचे वर्णन करावयाचे आणि शेवटी म्हणायचे 'स जनास इंद्र:' या वर्णनांमुळे इंद्रासंबंधीची बरीच माहिती मिळते. तो उंचापुरा, धिप्पाड तरीही अतिचपळ होता. त्याचे केस, दाढी इतकेच काय भुवयाही सोनेरी होत्या. हे सगळे वर्णन करताना गृत्समद ऋषी या सैनिकांना सांगत होते की अशा गुणांनी संपन्न असलेला जो आहे असा 'स जनास इंद्रः' अरे, तो इंद्र या नावाने ओळखला जातो. थोडक्यात काय की ते असे सांगायचा प्रयत्न करत होते की तो मी नव्हेच. तुम्ही मला कशाला धरून आणले आहे. या सूक्ताच्या तिसऱ्या ऋचेमध्ये ते असे म्हणतात,
'यो हत्वाहिमरिणातसप्तसिंधून्यो गा उदाजदयधावलस्य ।
यो आश्मनोरंतरग्नि जजान सवृक्समत्स् स जनास इंद्रः । (ऋग्वेद २.१२.३, अथर्ववेद २०.३४.३ )
याचा अर्थ असा होतो की, हे लोकांनो, अहिचा वध करून सप्तसिंधूंना विमुक्त करणारा, वलाच कैदखान्यातील धेनूंना बंधमुक्त करणारा, मेघातून अग्नी उत्पन्न करणारा, तसेच युद्धात शत्रुसंहार करणारा इंद्र हा असा आहे. यामध्ये उल्लेखलेल्या सात नद्यांमध्ये (सप्तसिंधून्यो) सरस्वती ही एक नदी हो पंजाबातील आजच्या पाच नद्या आणि सिंधू नदी या उर्वरीत सहा नद्या आहेत.
तसेच ऋग्वेदातील अनेक ऋचांमध्ये (क्र. ४.११.३, ८.९३.१, १०.४३.३ आणि १०.४९. आणि या इंद्राच्या सूक्तांमध्ये सप्त नद्यांना प्रवाही केल्याचा स्पष्ट उल्लेख येतो. इंद्र अडलेले नद्यांचे पाणी प्रवाही करतो असा उल्लेख येतो. ऐतिहासिक दृष्ट्या या घटना म्हणजे इंद्र त्या आटत चाललेल नद्यांच्या प्रवाहांना डोंगरात जाऊन स्फोटकांच्या साहाय्याने दगड फोडून मोकळे करत होत पंजाबातील पाच नद्या, सिंधू आणि सरस्वती ह्या त्या उल्लेखिलेल्या सप्त सिंधू आहेत. यातील पहिल्य पाच नद्या आणि सिंधू नदी आजही प्रवाही आहेत. परंतु सरस्वती नदी मात्र आटून गेली. भूगोलातील पुराव्यानुसार हा कालखंड इ.स.पू. २२०० असा आहे. या सरस्वती नदीचे पात्र हे अधिकाधिक २० किलोमीटर (हिमाचल प्रदेशात) आणि कमीतकमी ८ किलोमीटर (राजस्थानात) एवढे होते. हा सर्व प्रवाह अचानक एका रात्रीत आटू शकत नाही. तो हळूहळू क्षीण होत जातो. याचा कालावधीसुद्धा अनेक शतकांचा असतो, किमान १००० वर्षांचा तरी नक्कीच. याचा अर्थ असा की इ.स. पूर्व २२०० मध्ये आटलेल्या नदीचा क्षीण होणारा प्रवाह गृत्समद ऋषींनी त्याच्या किमान १००० वर्षांपूर्वी (किंवा त्याहूनही अधिक वर्षे) नक्की पाहिला असणार. सरस्वती नदीचा उल्लेख ऋग्वेदामध्ये ६५ वेळा येतो एवढेच नाही तर तिचे वर्णन त्यांनी नदीतमे अम्बितमे देवीतमे सरस्वती, म्हणजे महान नदी, महान माता आणि महान देवी असे केले आहे. गृत्समद ऋर्षीनी पूर्ण रूपाने प्रवाहित असणाऱ्या सरस्वतीला नक्कीच पाहिले असणार. तो काळ गृत्समद ऋषींपेक्षा १००० वर्षे जुना असू शकतो. म्हणजे इ.स. पूर्व ५००० ते ४००० वर्षे, वैज्ञानिक सत्याच्या आधारावर ऋग्वेदाचा काळ हा इ.स. पूर्व १५०० च्या खूपच मारे जातो. या सत्याचा स्वीकार आता जगाने केला आहे.
२. भारतीय शिल्पकलेची सुरुवात
भौगोलिक घटनांच्या आधारे एक गोष्ट मात्र नक्की की सरस्वती नदीच्या सुकाण्याची सुरुवात होण्याच्या पूर्वीचा काळ इ.स. पूर्व ५००० ते ३००० हा नक्की होता. त्याच्या नंतर हळूहळू प्रवाह आटत गेला आणि इ.स. पूर्व २२०० ते इ.स. पूर्व १९०० या दरम्यान पूर्ण आटला. याच कालखंडात सरस्वती-सिंधू संस्कृती विकसित झाली आणि या नदीबरोबरच नामशेषही झाली.
ऋग्वेदामधील उल्लेख याच नदीच्या पूर्ण प्रवाही अवस्थेचे आढळतात. त्याचबरोबर आणखी एक अत्यंत सूक्ष्म खगोलशास्त्रीय निरीक्षण नोंदल्याचे आढळून येते. ऋग्वेदात वसंत संपात हा मृगनक्षत्रात येत असल्याचा उल्लेख आहे. ही प्रक्रिया सुमारे इ.स. पूर्व ५५०० ते इ.स. पूर्व ३००० पर्यंत होत होती. इ.स. पूर्व ३००० नंतर वसंत संपात कृत्तिका नक्षत्रात येत असल्याचा उल्लेख तैत्तिरीय संहितेत येतो. लोकमान्य टिळकांच्या 'ओरायन' या ग्रंथात याचे विस्तृत निवेदन आहे. या दोन्ही घटनांच्या उल्लेखानुसार ऋग्वेदाची रचना करायचा कालखंडही इ.स. पूर्व ५००० नंतर सुरू झालेला असणार कारण त्या वेळेस वसंत संपात मृग नक्षत्रात होत होता. पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मते सिंधू संस्कृतीचा हास हा इ.स. पूर्व २००० मध्ये झाला. मग त्या पुढील ५०० वर्षाचा काळ हा ऐतिहासिक दृष्ट्या या देशामध्ये अंधकारमय होता. लोक जंगलामध्ये किंवा छोट्या खेड्यांमध्ये राहत होते आणि या बिचाऱ्यांवर बाहेरून आलेल्या आर्यांनी तुफानी आक्रमण करून त्यांना पराजित केले. इ.स. पूर्व १५०० च्या दरम्यान याच आर्यांनी वेदांची निर्मिती केली. या युक्तिवादामध्ये आर्य बाहेरूनच वेद घेऊन आले असे निदान सांगितले जात नाही किंवा असे म्हणायला ते धजावले नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे वेदांमध्ये उल्लेखलेल्या नद्या, डोंगर आणि अन्य स्थळे ही सर्व भारतातीलच आहेत.
वैदिक भारतीय आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीतील भारतीय हे समकालीन का एकच ? यावर अद्याप वाद सुरू आहेत. परतु भारतीय कलांच्या इतिहासाचा विचार करता आपल्याला वेदाच आधार चारावा लागतो. याचे कारण असे की आजपर्यंतच्या कला परंपरांचे बीज हे थेट वेदशा में आढळते. त्यामुळे या परंपरेची अक्षुण्णता हाच धागा धरून आपल्याला भारतीय कलांचा मात्र घ्यावा लागतो. ऋग्वेदामध्येच अनेक कलांचे तपशीलवार वर्णन येते. ज्यामध्ये प्रामुख्याने नृत्य संगीत आहे. परंतु ऋग्वेदामध्ये कठीण परिस्थिती आलेल्या व्यक्तीने दहा गावे देऊन कोण मान इंद्राला विकत घेईल अशी पृच्छा केलेली आढळते. दुसऱ्या उल्लेखात इंद्राला दहा हजार किंवा श हजारालाही न विकण्याची चर्चा केली आहे. (नी. पु. जोशी, ऋग्वेद ४.२४.१० आणि ऋग्वेद ८.१.० याचा अर्थ देवदेवतांच्या मूर्ती ह्या नक्कीच कोरल्या जात होत्या. परंतु त्या दगडी नसून काष्ठ शिल असाव्यात. पुढील काळामध्ये म्हणजे इ.स. पूर्व ३०० (मौर्य काळात) दगडी शिल्पांचे उत्कृष्ट को काम सुरू झाले असावे. याचे फार थोडे पुरावे सापडलेले आहेत. पटना संग्रहालयामध्ये असतं दीदारगंज यक्षी या नावाने प्रसिद्ध असणारे शिल्प हे त्या काळातले मानले जाते. आजच्या पटल शहराजवळच दीदारगंज आहे. तेथे नदी काठावर अनेक वर्षे चिखलात गाडल्या गेलेल्या परंतु अत्या गुळगुळीत अशा एका दगडाचा वापर कपडे धुण्यासाठी तिथले धोबी करत होते. एक दिवशी दगडाखाली साप गेला असा संशय येऊन त्याला काढण्यासाठी हा दगड उचलला गेला. तेव्हा त्यांच लक्षात आले की अनेक दशके ते ज्याच्यावर कपडे धूत होते तो दगड नसून एका स्त्री मूर्तीची पाठ आहे हीच त्या दीदारगंजच्या यक्षीची शोध कथा. या मूर्तीविषयी एक गोष्ट मात्र नक्की सांगता येते की स्त्री देह शिल्पांकन कसे करावे हे त्या काळातच निश्चित झाले होते. हे शिल्प पाहताना स्त्री सौंदर्याचे मानुषीका (Womanhood personifide) झाले असेच म्हणावे लागेल. खरेतर ही यक्षीची मूर्ती नाही तर ती एक चौरीधारक स्त्रीची आहे. याचा अर्थ हिचे प्रतिबिंबरूप दुसरीही मूर्ती असली पाहिजे. त्याचबरोबर तिच्च हातातल्या चौरीने ती ज्या मूर्तीला वारा घालत असावी ती एखाद्या राजाची किंवा देवाची मूर्तीही त काळी असावी.
भारतीय शिल्पकलेचा उगम जरी या कालखंडात झाला असला तरी त्याला गती मिळाली ती शु काळामध्ये, सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ याच्या मृत्यूनंतर (इ.स. पूर्व १८७) शुङ्ग वंशातीत असणाऱ्या आणि त्याच्याच सैन्याचा सेनापती असलेल्या पुष्यमित्राचा राज्याभिषेक झाला. सम्राट अशोकाच्या काळापासून असलेला बौद्ध धर्माचा राजाश्रय गेला. तसेच सम्राट अशोकाच्या अहिंसेचे अतिरेकी आणि अविवेकी आग्रहही पुष्यमित्राने सोडून दिले त्यामुळे तो अत्यंत लोकप्रिय झाला. असे असले तरीही बौद्ध पंथाचे अनुयायी हे समाजात होते. त्यामुळे राजाश्रयाशिवाय तो टिकवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. याच कालखंडात अफगाणिस्तानच्या प्रदेशातील काही ग्रीक लोकही बौद्ध झाले होते आणि त्यांना उपासनेसाठी मूर्तीची आवश्यकता जाणवत होती. ग्रीक संस्कृतीमध्ये मूर्तिपूजा प्रचलित होती. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीकांनी बांधलेती मंदिरे आणि त्यांचे अवशेष आजही त्यांच्या भव्यतेची साक्ष देतात. या मंदिरात ते त्यांच्या देवांच्या मूर्ती बसवत आणि त्याचे पूजन करत. तीच पद्धत त्यांनी त्यांच्या विस्तारलेल्या साम्राज्यातही आणली. पुढे हे ग्रीस देशापासून लांब राहणारे जेव्हा बौद्ध झाले तेव्हा त्यांना उपासनेसाठी आराध्य दैवताच्या मूर्तीची आवश्यकता भासू लागली. बौद्ध पंथात मूर्तिपूजा नव्हती तरी या ग्रीकांनी मूर्ती घडवून त्यांचे पूजन सुरू केले.
याच काळात विशेषतः उत्तर भारतात भागवत धर्म मोठ्या प्रमाणात प्रभावी होता. विष्णू प्रमुख देव झाला होता. त्यामुळे त्या वैष्णवांनी विष्णूच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली होती. त्याच प्रमाणे शैव पंथाचे अनुयायी लिंग रूपात शिवाचे पूजन करत होते. त्यामुळे बौद्धांनाही मूर्तिपूजनाची आवश्यकता अधिकच वाटू लागली. पांथिक स्पर्धेमुळे भारतीय मूर्तिकलेला खूपच मोठे प्रोत्साहन मिळाले.
सनातन धर्मात, ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो, देवांची उपासना आणि पूजन हे व्यक्तिगत होते. त्याच्या विरुद्ध बौद्ध हा पंथ असल्यामुळे त्याची रचना श्रेणीशः होती. एकेश्वरवादी सर्व पंथांमध्ये अशीच रचना असते. त्यामुळे सामूहिक उपासना तिथे अपरिहार्य ठरते. आपल्या पंथातील अनुयायी टिकवून ठेवण्यासाठी हे करावेच लागते. अशा पंथांमध्ये सण फारच थोडे असतात. सतत सामूहिक पूजन करत असल्यामुळे एकत्रित येऊन काही 'साजरे' करायचे याचे प्रयोजनच राहत नाही. सामूहिक एकत्रीकरणासाठी काही विशेष वास्तूंची निर्मिती करावी लागते. अशा प्रकारच्या विशाल प्रार्थनास्थळांची निर्मिती मध्य आशियात, ग्रीस आणि रोम येथे झाली होती. बौद्धांच्या सामूहिक एकत्रीकरणासाठी अशा वास्तूंची निर्मिती झाली असावी असे स्तूप किंवा चैत्य लेणे यांचे स्थापत्य पाहून वाटते.
सनातन धर्मात अशा सार्वजनिक पूजा करण्याच्या वास्तूंची आवश्यकताच नव्हती त्यामुळे त्या काळात जेव्हा मोठ्या प्रमाणात स्तूप आणि लेण्यांची निर्मिती होत होती तेव्हा देऊळ ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. म्हणूनच त्या वेळेस देवळे बांधली गेली नाहीत. वैज्ञानिक प्रगतीच्या एका टप्प्यावर ते ज्ञान शाश्वत करण्यासाठी देवळे बांधण्याची गरज भासली आणि इसवी सनाच्या आठव्या शतकानंतर मोठी देवळे बांधली गेली.
हिंदू धर्मात सणांचे वेगळे महत्त्व होते. त्या दिवशी समाजातील सर्वांनी भेदभाव विसरून एकत्रित येऊन आनंद साजरा करायचा. एकत्रित गायन आणि नर्तन त्यात होत असे. बदलत्या ऋतूप्रमाणे वर्षातील दिवस नक्की केले होते. त्या ऋतूप्रमाणे आरोग्याला हितकारक पक्वान्ने आणि मिष्टान्ने करून सर्वांनी एकत्रित भोजन करावे अशी रचना होती.
हिंदू समाजाच्या आजच्या अवनत अवस्थेचे हेही एक कारण आहे. वैयक्तिक किंवा कुटुंबांपुरते मर्यादित असणाऱ्या देवांना चौरस्त्यावर नेले आणि त्यांचे सामूहिक पूजन सुरू केले; सामूहिकपणे साजरे करायचे सण मात्र फक्त कुटुंबांमध्ये साजरे होऊ लागले.
३ पूजास्थळांची निर्मिती को स्तूप आणि मंदिर
४. सहेतुक शिल्पकलेच उषःकाल-कोरीव लेणी
५. हिंदू शिल्पांची निर्मिती
मूर्तिशास्त्राचा उगम :-
६. मंदिर कल्पनेचा विस्तार आणि विकास
चित्र क्र. १४: भूवराह, उदयगिरीलेणी मंदिरे
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये काही मंदिरे बांधली गेली, परंतु त्यातील एकही वास्तू सापडलेले नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देवायतन असा उल्लेख येतो. कुठल्या चौकात कुठले मंदिर असाई असेही त्रोटक उल्लेख आहेत. परंतु ह्या सगळ्या लहान वास्तू असाव्यात असे वाटते. मूर्तिशास्त्राचे निका प्रमाणित झाल्यावर या मूर्तीना कुठेतरी बसवले गेले पाहिजे हे तर नक्कीच होते. त्यासाठी प्रचलित लेणी कोरण्याच्या पद्धतीमध्ये लेणी मंदिरे करण्याचा प्रयोग झाला. गुप्त वंशाचा चंद्रगुप्त द्वितीय (इ.स. ३८० ते ४२०) याच्या कारकिर्दीत मध्य प्रदेशमध्ये विदिशाजवळ लेणी मंदिर कोरण्याचा प्रयोग झाला आजच्या भिलसा या गावी 'उदयगिरी गुंफा' या नावाने ते प्रसिद्ध आहे. यामध्ये एकाच डोंगरात दोन- तीन मंदिरे करण्याचा तो प्रयोग होता. त्यातल्या एका गुहे बाहेर स्तंभावर आधारित छत असेहे करण्याचा प्रयोग केला. आज तो भाग अस्तित्वात नाही. यामध्ये एक केवळ शेषशायी विष्णूचेही शिल्प एका गुहेत कोरले आहे. त्याच्या शेजारी वराहाचे मोठे शिल्प असलेली गुंफा हे तेथील सर्वात मोठे लेणीमंदिर. यातील मूर्तीचे तपशील पुढे येतीलच. देशातील अन्य काही लेणी मंदिरांमध्ये कर्नाटकातील बदामी, ऐहाळे (इ.स.६. वे-७ वे शतक), आंध्र प्रदेशमधील अक्कण्णा मादण्णा, मोगलाजपुरम्, उंडवली (इ.स.७ वे ८ वे शतक), महाराष्ट्रातील वेरुळ (क्रमांक १४ ते ३१), घारापुरी-मुंबई, पाताळेश्वर-पुणे (इ.स. ७ वे ते ९ वे शतक) यांचा उल्लेख करता येईल.
चित्र क्र. १५: उदयगिरी लेणी, विदिशा

चित्र क्र. १६: दशावतार मंदिर, देवगड
बांधलेली मंदिरे (इ.स. ४ थे ते ८ वे शतक)
या लेणी मंदिरे कोरण्याच्या कालखंडात दगडावर दगड रचून मंदिरे करण्याचाही प्रयोग सुरू झाला. देवगड, नचना, भुमराह या गावी ही सुरुवातीच्या काळात बांधलेली मंदिरे आढळतात. एका चौथऱ्यावर ज्याचे माप साधारण २०-२० फूट आणि ज्याच्यावर साधारण १०-१० फूट उंचीचे चौकोनी बांधकाम. ज्यामध्ये एक गर्भागृह आहे असे यांचे स्थापत्य आहे. संपूर्ण देशभर अशा पद्धतीची दगडी मंदिरे बांधण्याचे किंवा लेणी मंदिरे कोरण्याचे काम या काळानंतर सुरू झालेले दिसते. बांधलेल्या मंदिरामध्ये सातव्या शतकापर्यंत लहान आकाराचीच मंदिरे प्रामुख्याने बांधली गेली. यांची सर्वात मोठी प्रयोग शाळा कर्नाटकमधील पट्टदकल आणि ऐहोळे या गावी आढळते. येथे विविध प्रकारच्या आणि आकारांच्या मंदिरांचे प्रयोग केलेले दिसतात. नागर, द्राविड इ. शैलींची मंदिरे इथे दिसतात. नागर म्हणजे वर निमुळते होत जाणारे शिखर. तर द्राविड म्हणजे आडव्या थरांमध्ये विभागून निमुळते होणारे शिखर. अशी या शैलींची नावे आणि प्रकार आहेत. या समूहातील सर्वात मोठे मंदिर (विरुपाक्ष मंदिर) हे साधारणतः ३० फूट उंचीचे आहे.
चित्र क्र. १७: पार्वती मंदिर, नचना
मोठी मंदिरे (इ.स. ८ वे ते १३ वे शतक)
या संपूर्ण कालखंडामध्ये म्हणजे वेदकाळापासून सातव्या शतकापर्यंत या वैचारिक आणि धार्मिक प्रगती बरोबरच वैज्ञानिक प्रगतीही समांतर आणि तितक्याच गतिमानतेने धावत होती. किंबहुना अनेक वेदांमधल्या कथांपासून पुराणकथांमध्ये वैज्ञानिक सिद्धान्ताचे संदर्भ दिसतात. वेदकाळापासून भारक वैज्ञानिकांची एक अक्षय्य परंपराही सातत्याने दिसते. याच परंपरेमध्ये सातव्या शतकामध्ये २० प्रदेशामध्ये कायथा या गावी वराहमिहीर नावाच्या एका थोर शास्त्रज्ञाचा जन्म झाला. त्याच्य 'बृहद्ङ्कथा' या ग्रंथामध्ये स्थापत्यशास्त्रावर एक स्वतंत्र अध्यायच आहे. त्यात त्याने स्थपतिर ब्रह्मांडाची प्रतिकृती ज्यात दिसेल अशी वास्तू साकारण्याचे आवाहन केले आहे. यानंतरच्या काळात मंदिर स्थापत्यांमध्ये केवळ देवदेवतांच्या मूर्तीना ठेवण्याचे स्थान असा हेतू न राहता, त्याचबरोबर प्रचंड आकारमानाच्या वास्तूंचीही निर्मिती करण्याचे चिंतन आणि प्रयोग सुरू झाले. विशाल मंदिर निर्मितीच्या परंपरेला या देशातील शास्त्रज्ञ कारणीभूत ठरले आहेत.
चित्र क्र. १८: रथमंदिर, महाबलीपुरम
महाबलीपुरम् येथे अखंड दगडातून कोरून मंदिर करण्याचेही प्रयोग सातव्या शतकात सुरू झाले होते. यामध्ये पाच पांडवांचे रथ हा त्यापैकीच एक प्रयोग. इथे समुद्रकिनाऱ्यावर असलेले दगडात बांधलेले एक मोठे मंदिर आहे. ज्याला 'शोर टेम्पल' असे म्हणतात. महाबलीपुरम्ची मंदिरे नरसिंहवर्मन पहिला (इ.स. ६३० ते ६७०) या राजाच्या काळात बांधली गेली. आठव्या शतकात सुरुवातीला कांचीपुरम येथे कैलासनाथान मंदिराचे बांधकाम झाले. राजा नरसिंहवर्मन दुसरा (इ.स. ६९० ते ७१५) व त्याची राणी रंगपताका यांच्या प्रयत्नांनी हे कैलास मंदिर उभारण्यात आले. मोठ्या आणि भव्य मंदिराची सुरुवात इथून आली. याच्यानंतर राजा नंदिवर्मन (इ.स. ७१७ ते ७७९) याच्या कालखंडात कांचीपुरमचे प्रसिध्द वैकुंठ-पेरूमाळ मंदिराचे बांधकाम झाले. आजही हे भव्य मंदिर तेथे आहे. परंतु जीर्णोद्धारामध्ये त्या मूळ स्वरूप गेले आहे. मंदिरे बांधायचे कार्य सुरू झाले आणि या कालखंडानंतर हजारो मंदिरांचे
निर्मिती देशभरात झाली असली तरी त्यातली विकसित आणि भव्य मंदिरांची संख्या मात्र खूपच कमी आहे.
या पुढील काळात विकसित अवस्थेतील मंदिराचे स्थापत्य प्रस्थापित होऊ लागले होते. मुखमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः या मंदिरांची रचना होती आणि गर्भगृहावरती उत्तुंग असे शिखर ज्याची उंची ५० फुटापेक्षाही अधिक होती. ही झाली मोठी मंदिरे बांधण्याची सुरुवात. यानंतर देशातील अन्य भागातही अशी मंदिरे बांधण्याचे प्रयोग सुरू झाले.

चित्र क्र. १९: कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम
राष्ट्रकूट वंशाचा राजा कृष्ण पहिला (इ.स. ७५६ ते ७७३) याच्या काळात महाराष्ट्रामध्ये वेरुळ मधल्या कैलास मंदिराचे काम सुरू झाले. असे म्हणतात की त्याची राणी माणिकावती हिने कांचीपुरम येथील कैलासनाथाच्या मंदिरासारख्या पण त्याहूनही भव्य अशा महाराष्ट्रात बांधल्या गेलेल्या मंदिराचा कळस पाहिल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करणार नाही अशी विचित्र प्रतिज्ञा केली. एका व्यक्तीच्या उपोषण काळात पन्नास फुटाहून अधिक उंचीचे आणि भव्य मंदिर बांधून काढणे अशक्यच होते. या समस्येवर मात करण्यासाठी पैठणचा एक अज्ञात शिल्पी पुढे सरसावला. त्याने डोंगरावर जाऊन दोन दिवसांमध्ये एका देवळाचा केवळ कळस कोरला व तो त्या राणीला दाखवून तिची प्रतिज्ञा पूर्ण केली असे म्हणतात. इथून एका डोंगरातून संपूर्ण आणि एकसंध मंदिर कोरण्याच्या अचाट प्रयोगाची सुरुवात झाली. हे मंदिर कोरण्याचे काम जे इसवी सनाच्या आठव्या शतकात (सुमारे इ.स. ७७० पासून) सुरू झाले ते दहाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (इ.स. ९१३) म्हणजे कृष्ण राजाच्या पतवंडांपर्यंत सुरू होते. शंभर फूट उंच, १७० फूट रुंद आणि जवळ जवळ १७५ फूट लांब असे विराट मंदिर साकार झाले. कांचीपुरमच्या मंदिराशी स्पर्धा असल्यामुळे पूर्णपणे दक्षिण भारतीय धाटणी (द्राविड शैलीचे) असूनही परंतु महाराष्ट्रात प्रकटलेले, तसेच महाराष्ट्रातले हे सर्वात मोठे मंदिर आहे.

चित्र क्र. २०: कैलास मंदिर, वेरूळ
दहाव्या शतकामध्ये उत्तर भारतात खजुराहो येथे चंदेल घराण्याच्या महासत्तेचा उदय झाला.या कालखंडात येथे मंदिर बांधण्याच्या कामाला विलक्षण गती आलेली दिसते. याच वंशातील यशोवर्मन (लक्ष्मण वर्मा) (इ. स. ९२५ ते ९५०) याने खजुराहो येथील लक्ष्मण मंदिर हे पहिले भव्य मंदीर बांधले. याचा मुलगा धंगदेव (इ.स. ९५० ते १००२) याने विश्वनाथ आणि पार्श्वनाथ ही दोन देखणी बांधली. त्यानंतर राज्यावर आलेल्या गंडदेवाच्या कारकिर्दीत जगदंबी आणि चित्रगुप्त ही मंदिरे बांधली गेली. ह्यानंतर याचा मुलगा विद्याधर (इ.स. १००४ ते १०२९) हा गादीवर बसला. त्याने इ.स. १०१९ ते १०२२ या काळामध्ये महंमद गजनीचा दोनदा युद्धात पराजय केला. यानेच खजुराहो मधल्या खंडारिया महादेव या मंदिराची निर्मिती केली. इ.स. ११०० पर्यंत खजुराहोमध्ये एकूण ८५ मंदिरे बांधली गेली. त्यातील आज १० ते १२ शिल्लक आहेत. एकाच परिसरात भव्य मंदिरांची निर्मिती असणारे हे भारतातील एकमेव स्थान आहे.

चित्र क्र. २१ : लक्ष्मण मंदिर, खजुराहो
१०० फूट उंचीची लक्ष्मण, विश्वनाथ आणि खंडारिया महादेव अशी तीन मंदिरे खजुराहो येथील पश्चिम समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैदानात आहेत. या नंतरच्या काळातील भव्य मंदिराची निर्मिती तामिळनाडू प्रांतातील तंजावर येथे झाली. चोल घराण्याचा राजराजा चोल (इ.स. ९८५ ते १०१२) आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोल (इ.स. १०१२३ १०४४) याच्या कारकिर्दीत भारतातील अतिभव्य अशा दोन मंदिरांची निर्मिती झाली. यातील तंजावर येथील बृहदीश्वराच्या मंदिराचे बांधकाम राजराजाच्या कारकिर्दीत सुरू झाले परंतु ते संपूर्ण होण्याला आतच त्याचा मृत्यू झाला, त्याचा मुलगा राजेंद्र चोल याने ते बांधकाम पूर्ण करून घेतले. परंतु त्याचबरोबर तिथून जवळच गंगाईकोंडचोलापुरम येथे दुसरे बृहदीश्वर गंगाईकोंडचोलेश्वराचे मंदिर बांधले. दोन्ही मंदिराचे वैशिष्ट्य असे की तत्कालीन मध्यम आकारांच्या मंदिरापेक्षा जवळजवळ ४० पटीने हैं मंदिरे मोठी आहेत. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराला 'दक्षिण मेरू' असे संबोधले आहे आणि भगवान शिव म्हणजे अवकाश या कल्पनेचे हे परमाकाश असे रूप आहे. (वात्स्यायन १९९६, नागास्वामीः ३०१ - ३०८). ह्या दोन्ही मंदिरांची उंची अनुक्रमे २०० फूट आणि १८० फूट एवढी आहे.

चित्र क्र. २२: बृहदीश्वर मंदिर, तंजावर
तेराव्या शतकामध्ये ओरिसामध्ये राजा नरसिंह देव दुसरा (इ.स. १२३४ ते १२६८) याने इ.स. १२५८ मध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर बांधले. या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखराची उंची २२० फूट एवढी होती. भारतातील हे सर्वात मोठे मंदिर होते. सतराव्या शतकात हा भाग ढासळला आणि आज त्याचे १८० फूट उंचीचे जगमोहनावरील शिखर उभे आहे. इ.स. १२४४ मध्ये राजा नरसिंह देव याने बंगालवर स्वारी केली आणि तेथील सुलतान तुघ्रील तुघान याचा दारुण पराभव करून तो प्रदेश मुक्त केला. त्याच्यात त्याला प्रचंड मोठी संपत्ती मिळाली. ही मिळालेली संपत्ती त्याने सर्व सैनिकांमध्ये वाटून टाकण्याची योजना केली. हे त्याच्या आईला कळताच तिने त्याला विचारले की या संपत्तीवर फक्त सैनिकांचाच अधिकार कसा? तुम्ही रणांगणावर लढत असताना येथील सर्व समाजही तुमच्या लढ्यात सामील असतोच. तेव्हा या संपत्तीवर सर्व समाजाचा अधिकार आहे, म्हणूनच या धनाचा विनियोग समाजहितासाठीच झाला पाहिजे. हे ऐकल्यावर राजाने आपला निर्णय बदलला आणि या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी तो पैसा वापरला. या मंदिर निर्मितीचा सर्व तपशील बय चकडा या १३ व्या शतकात सापडलेल्या हस्तलिखितात आढळतो.
मंदिराचे स्थापत्य अभ्यासताना असे लक्षात येते की भारतामध्ये १०० फूट किंवा अधिक उंचीची फारच थोडी मंदिरे शिल्लक आहेत. खजुराहो येथील वैद्यनाथ मंदिर आणि त्यासारखी तिथली अन्य मोठी मंदिरे ही १५ व्या शतकात आलेल्या सिकंदर लोधी याने तर विदिशा येथील बीजमंडल हे भव्य सूर्य मंदिर १७ व्या शतकात औरंगजेब याने उद्ध्वस्त केले. तसेच चंदेल घराण्याने बांधलेली सिंहोनिया येथील भव्य मंदिरेही अत्यंत भग्न अवस्थेत उभी आहेत.

चित्र क्र. २३ : सूर्यमंदिर, कोणार्क
मूर्तिशास्त्राविषयीं.....
वाङ्मयीन साधनें :
वेदशास्त्रमूलक पौराणिक संस्कृतीवर आधारलेल्या आजच्या ब्राह्मणधर्मांत ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे स्थान बरेच वरचे मानले जाते. रज, सत्त्व आणि तम या तीन गुणांचे हे तिघे प्रतिनिधी आहेत. सृष्टीचे उत्पादन, पालन व तिचा शेवट ही ब्रह्मदेव, विष्णू व शंकर यांची प्रमुख कार्ये मानली गेली आहेत. सारांश सृष्टीचा सगळा पसारा या तिघांशीच संबंद्ध आहे. या दृष्टीने हे तीन देव म्हणजे ब्राह्मणधर्माच्या देवतासंघाचे मुख्य तीन खांब आहेत. पूर्वी ब्रह्मदेवाचे पूजन चांगलेच रूढ होते. पण पुढे तो अपूज्य मानला जाऊ लागला, व त्याचे उच्च स्थान स्वीकार करून ही पूजनीय देवतांच्या यादीतून त्याला वगळण्यात आले. पण या बरोबरच सूर्य, गणपती व देवी यांची मान्यता वृद्धिंगत होऊं लागली. हळूहळू विष्णू, शिव, सूर्य, गणपती व देवी यांची उपासना पंचदेवोपासना या नांवाने समाजात रूढ झाली व आतापर्यंत तिची मुळे बरीच खोल गेली आहेत.वर उल्लेख केलेल्या पांच देवांचे वैष्णव, शैव, सौर, गाणपत्य व शाक्त असें पांच संप्रदाय आहेत व प्रत्येकाचे पोटभेद ही बरेच आहेत. इतिहासाची पानें उलटल्यास यांचे परस्पर विरोध, एकाने दुसऱ्यावर वेळोवेळी केलेली कुरघोडी, एकेश्वरवादाचा आधार घेऊन परस्परांना जवळ आणण्यांचे प्रयत्न, देशकालपरत्वे एकामेकांचे श्रेष्ठत्व, वगैरे बऱ्याच गोष्टी आढळून येतात. पण त्यांची दखल घेण्यांचे तूर्त कारण नाही. तूर्त एवढाच उल्लेख करून पुढे जाऊ की परस्पराचा विरोध टाळण्यांसाठी पाचही देवांचे एकत्र पूजन 'पंचायतनपूजन' या नांवाने चालू झाले. याला आद्य शंकराचार्यांमुळे बरीच मान्यता मिळाली. सवलत एवढीच ठेवण्यांत आली कीं जें ज्यांचें इष्ट असेल त्याची स्थापना मधे करावयाची व इतरांना चारी दिशांना बसवावयाचे व त्याप्रमाणें पंचायतानाला 'विष्णु पंचायतन' व 'शिवपंचायतन,' 'गणेशपंचायतन,' 'सूर्य पंचायतन' व 'देवीपंचायतन' अशीं नांवे देऊन उपासना करावयाची. याच तत्त्वांवर मंदिरांची बांधणी करताना मधोमध एक मोठे देऊळ व चार दिशांना चार लहान देऊळें अशी 'पंचायतन मंदिरांची' रचना करतात.
विष्णूची प्रामुख्याने उपासना करणारे वैष्णव, शिवाचे उपासक शैव, गणपतीचे गाणपत्य, सूर्याचे सौर व देवीचे शाक्त या नांवाने ओळखले जातात पण कोणाविषयी अभिनिविष्ट न होता सर्वांचे समान स्थान मानणारे 'स्मार्त' म्हणवितात. वर सांगिलेल्या संप्रदायाचे पुरस्कार करणारे साहित्य भरपूर आहे. त्यांत पुराणें, दार्शनिक ग्रंथ, आगमसाहित्य, लीला व कथा साहित्य, स्तुतिपर गेय साहित्य या सर्वांचा समावेश होतो. या शिवाय प्रत्येक पोटशाखेचे वाङ्मय वेगळेच! या सर्व ग्रंथातूनच पंचदेवोपासनेशी संबंधित मूर्तीच्या विषयी बरीचशी माहिती मिळते. किंबहुना मूर्तिशास्त्राच्या अध्ययनाचा डोलारा याच वाङ्मयाच्या भक्कम पायावर उभारला जातो. एवढ्याकरितां या वाङ्मयाची थोडी तोंड ओळख करून घेणें आवश्यक व उपयोगी आहे.

वैदिक वाङ्मय :
हिंदुधर्माचा मूलाधार ग्रंथ वेद होय. वेद हे वाङ्मय आहे. त्यांत प्रार्थना विभाग, यज्ञ विभाग व गान विभाग हे तीन मुख्य विभाग करून त्यांस अनुक्रमें ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद अशी नांवे दिली. ही झाली 'वेदत्रयी'. अथर्ववेद म्हणून वेदांचा चौथा विभाग ही मानतात. वेदाचा मंत्रभाग 'संहिता' या नांवाने ओळखला जातो. आर्य परंपरेप्रमाणें वेदाची रचना करणारा कोणी नाही. तो 'अपौरुषेय' आहे. वैदिक ऋषी त्या त्या मंत्राचे द्रष्टे' आहेत, सृष्टे नव्हेत. नवीन विचारकांना अर्थातच हे मत ग्राह्य नाही. वेदांचा रचना काल हा वादाचा विषय आहे. पण साधारणपणें असें मानतात की ऋग्वेदाचा रचना काल सुमारे ख्रिस्तपूर्व १,००० किंवा त्याच्याही पूर्वी असावा.वैदिक वाङ्मयाचा बराचसा भाग आज उपलब्ध नाही. उदाहरणार्थ ऋग्वेदाची एकच अर्थात् शाकल शाखाच आज अस्तित्वात आहे. वेदाच्या संहिता भागाचा याज्ञिक दृष्टीनें अभिप्राय स्पष्ट करणारे ग्रंथ 'ब्राह्मण' ग्रंथ होत. प्रत्येक वेदांचे ब्राह्मण खालील प्रमाणें आहेत-
ऋग्वेद - ऐतरेय आणि कौषीतकी
यजुर्वेद - शतपथ
सामवेद - जैमिनीय आणि पंचविंश किंवा ताण्डय
अथर्ववेद - गोपथ
ब्राह्मण साहित्यांत बरीच निरनिराळ्या प्रकारची माहिती संकलित आहे. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने इतरांपेक्षा शतपथ ब्राह्मण जास्त उपयोगी आहे. वैदिक वाङ्मयाचा दुसरा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे आरण्यक व उपनिषद् ग्रंथ. पण या ग्रंथाचा तत्त्वज्ञानाशी विशेष संबंध आहे. आपल्या विषयाच्या दृष्टीने यांचा केवळ जुजबी उपयोग आहे.
या वाङ्मयांत श्रौतसूत्रांचा ही समावेश करतात. प्रत्येक वेदाची श्रौतसूत्रे खालील प्रमाणें आहेत
ऋग्वेद - आश्वलायन, शांख्यायन
यजुर्वेद - आपस्तंब, बौधायन
सामवेद - कात्यायन
अथर्ववेद - वैतान
या प्रमाणें हे वैदिक वाङ्मय जरी अफाट असले तरी मूळांत हे यज्ञ-संस्कृती प्रेरक असल्यामुळे मूर्तिशास्त्राचे 'लक्षण-ग्रंथ' म्हणून याला ओळखता येत नाही. असें जरी असले तरी याकडे डोळेझाक करणें दोषावह आहे. पुढें विकास पावलेल्या देवतासंघाची बीजें या वाङ्मयक्षेत्रांत इतस्ततः विखुरलेली आहेत. बऱ्याच बाबतीत त्यांचेच पुढे पल्लवीकरण झालेले आहे. तेव्हां बऱ्याचश्या देवतांचे जुने धागेदोरे उकलण्याकरितां वैदिक साहित्याचा परामर्श अत्यावश्यक आहे. काही निवडक उदाहरणें पहा. ऋग्वेदांत इतस्ततः मंत्रदेवतांचे उल्लेख आहेत. त्यापैकी एक विष्णू हा आहे. येथे विष्णूला फार मोठे स्थान जरी नसले तरी ते अगदीच किरकोळ नाही. त्याने तीन पावलाने केलेल्या पराक्रमाची तोंड भरून स्तुती केलेली आहे. विष्णूचे हे महान कार्य म्हणजे पुढे पौराणिक काळांत वामनानें बळीच्या यज्ञांत त्रिविक्रमरूपाने केलेल्या पराक्रमाचे मूळ आहे. त्याचप्रमाणे ऋग्वेदांत इंद्र-विष्णू या जोड देवतांचे उल्लेख येतात. हे इंद्रविष्णूच पुढे इंद्र व उपेंद्र, वासुदेव व अर्जुन आणि नरनारायणाचे रूपानें वावरलेले आहेत. वेदाचा रूद्र पुढचा शंकर आहे, आणि गणपती आणि ब्रह्मणस्पती कदाचित गजाननाशी संबंद्ध आहे.
महाकाव्यें :
आजच्या भाषेत महाकाव्यें किंवा Epics म्हणून ओळखले जाणारे रामायण व महाभारत हे दोन फार महत्त्वाचे इतिहास ग्रंथ होत. आर्य व राक्षस संस्कृतीचा झगडा व आर्यसंस्कृतीचा विस्तार रामायणाचा वर्ण्य विषय असून भाऊबंदकी, राज्यतंत्र व गणतंत्र शासन पद्धतींची चुरस व त्याबरोबरच अनेक सामाजिक व दार्शनिक विषय, मतमतान्तरांची चर्चा, मुत्सद्देगिरीचे डावपेच व असल्याच अनेक प्रकाराची विस्तृत किंवा संक्षिप्त चर्चा महाभारतात आलेली आहे. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने या ग्रंथांत भरपूर माहिती असली तरी ती इतस्ततः विखुरलेली आहे. ते सर्वदुवे जर जुळवता आले तर इसवीसनाच्या सुरवातीच्या शतकांपर्यंतच्या बऱ्याचश्या मूर्तीवर चांगला प्रकाश पडतो. उदाहरणार्थ सोन्याची कुण्डले घालणारा पण पक्षीरूपांत असणारा गरूड, शंखचक्रगदाधारी कृष्ण, पशुमुखी मातृकांच्या बरोबर असणारा कार्तिकेय व त्याचा भाऊ विशाख, बलराम व कृष्णाची बहीण एकानंशा वगैरे देवतांच्या कुषाण कालीन मूर्तीना नीट समजून घेण्यास महाभारतातील अनेक उल्लेख व त्याचे खिलपर्व अर्थात् हरिवंश चांगलेच उपयोगी सिद्ध होतात. पुढे वेळोवेळी हे उल्लेख येणारच आहेत.पुराणें :
पुराणाचा विस्तार रामायण महाभारतांपेक्षा बराच मोठा आहे. मुख्य पुराणें अठरा, तितकीच उपपुराणें व याशिवाय अनेक स्थलपुराणें एवढा या शास्त्राचा पसारा आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतरे व वंशानुचरित अशी पुराणाची पांच लक्षणें जरी मानण्यांत आली तरी ती प्रत्येक पुराणांस सारखीच लागू होतात अशातला भाग नाही. पुराणाची रचना व्यासाने केली अशी जरी जुनी मान्यता असली तरी खरी गोष्ट म्हणजे पुराणें ही एकाच व्यक्तीची व एकाच काळातील रचना नसून ती वेळोवेळी निष्पन्न होणाऱ्या निरनिराळ्या प्रकाराच्या माहितीची भांडारें आहेत. नैमिषारण्यांत व इतरत्र सूतसंस्थे कडून वेळोवेळी परिचालित होणाऱ्या ज्ञानसत्राच्या आबालवृद्धांपर्यंत सोप्या भाषेत पोचविलेल्या त्या विवरण पत्रिका आहेत. हे ज्ञानकोष जिवंत व सुरक्षित ठेवण्याची जिम्मेदारी व्यास व सूत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पंडितांची होती.पुराणकारांनी ज्योतिष, छंदशास्त्र, आयुर्वेद, व्याकरण वगैरे निरनिराळे विषय हाताळले आहेत. मूर्तिशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टीने पुराण वाङ्मयाचा उपयोग अनेक प्रकारानें करून घेता येतो. 'मत्स्य' व 'अग्नि' सारख्या पुराणांत तर प्रतिमालक्षण, देवता प्रतिष्ठापन, तालमान या विषयांवर स्वतंत्र 'विष्णुधर्मोत्तरपुराणांचे' स्थान बरेच वरचे आहे. त्याच्या तिसऱ्या भागांत विविध देवतांच्या प्रतिमा, त्यांची आयुधें, त्यांच्या ध्यानांचे शास्त्रीय अर्थ, तालमान, देवतांची चित्रे व चित्रप्रक्रिया वगैरे विषयांवर स्वतंत्र व विस्तृत विवेचन आहे.
काही पुराणें विशिष्ट देवतांना धरून लिहिलेली आहेत. साहजिकच त्या त्या पुराणांत त्या देवतेची बरीच माहिती मिळते. उदाहरणार्थ मुद्गल व गणेशपुराणांत गणपती संबंधी माहितीचा सुंदर संग्रह आहे. देवीभागवत व मार्कण्डेय पुराण शाक्त संप्रदायाचे कंठमणी आहेत तर लिंग, वायु, वामन, कूर्म व शिव ही पुराणे शैव सांप्रदायाचे ज्ञानकोष आहेत. सांबपुराणांत सूर्याबद्दल सविस्तर माहिती मिळते. श्रीमद्भागवत, विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, विष्णूसंबंधी माहितीचा पुरवठा करतात. ब्रह्मवैवर्त त्या मानानें बरेच अलीकडचे पुराण आहे. राधा, गोलोक, श्रीकृष्णांची मधुरा भक्ती व त्याची ध्याने वगैरे गोष्टी या पुराणात मिळतात. पद्म व स्कंद यांना संकलन ग्रंथ म्हणावयास हरकत नाही. स्कंदात तर कितीतरी स्थलपुराणांचा समावेश आहे. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने ही सर्व पुराणें महत्त्वाची आहेत.
१) देवता प्रतिष्ठा, प्रतिमालक्षण देवालयनिर्माण
२) स्तुती व ध्यानाचे भाग. देवतांच्या सगुण ध्यानांत मूर्तीची वर्णनें आढळतात व स्तुती भागांत निरनिराळी नांवे संकलित असतात. या पैकी बरीच नांवे, उदाहरणार्थ गदाधर, खट्वांगिन्, खण्डपरशु, शाङ्गङ्ग वगैरे, आयुधांची परिचायक आहेत, विरुपाक्ष, भालचंद्र, लंबोदर, तीक्ष्णदंष्ट्रा हरितश्मश्रु, त्र्यंबक, वगैरे स्वरूपाची परिकल्पक आहेत. वाहनांचा परिचय घडविणारी गरुडवाहन, वृषध्वज, सिंहवाहिनी सारखी नांवे येथेच सापडतात.
याच संदर्भात बऱ्याच ठिकाणी हमखास असे कालसंकेत ही मिळतात. उदाहरणार्थ विष्णूच्या नूपुरांचे वर्णन किंवा कृष्णाच्या नाकांत घातलेल्या मोत्याच्या लोलकाचे वर्णन, किंवा देवीच्या नांकातील नथींचा उल्लेख नक्कीच दहाव्या शतकाच्या नंतरच्या गोष्टी आहेत. या किंवा या सारख्या दुसऱ्या उल्लेखाच्या मदतीनें अन्योन्याश्रय संबंधाला हातांशी धरून मूर्तीचा किंवा साहित्यिक उल्लेखांचा ही काल ठरविता येतो.
३) तीर्थक्षेत्रांची वर्णनें या दृष्टीनें उपयोगी पडतात. तीर्थदेवतांची ध्यानें व मंदिरे यांचे उल्लेख कधीकधी मूर्तिशास्त्रांवर प्रकाशाचे नवे झोत टाकतात.
४) आख्यानें व उपाख्यानें या दृष्टीने फारच उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ सांबपुराणांतील कृष्णाच्या मुलाला कुष्ठरोग झाल्यामुळे मग ब्राह्मणांचे येणें व त्यांनी उपचार म्हणून स्थापन केलेली सूर्योपासना-सूर्याच्या प्रतिमेची उपासना याचे वर्णन करणारे आख्यान मूर्तिशास्त्रांत दिसणाऱ्या इराणी वेश घातलेल्या सूर्यास समजून घेण्यांस उपयोगी आहे. सूर्याचे जोडे यावर प्रकाश टाकणारे रेणुकाचरित्र, त्वष्टा याची मुलगी संध्या हिचे आख्यान व इतर कथा या दृष्टीनें मननीय आहेत.
थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पुराणांत जागोजाग मूर्तिशास्त्रासंबंधी उल्लेख पसरलेले आहे, पण त्यांचे दुवे साधणे हे मात्र श्रमसाध्य असले तरी करण्यांयोग्य कार्य आहे.
स्मृतिसाहित्य हे मुळांत आचार साहित्य असल्यामुळे यांत मूर्तिशास्त्रबद्दल भरपूर माहिती मिळणें अर्थात्च शक्य नाही तरीपण प्रसंगोपात्त चर्चेच्या निमित्तानें बरेच उपयोगी उल्लेख आढळतात. उदाहरणार्थ प्रतिमांच्या निरनिराळ्या माध्यामां विषयी कण्व' वृद्धगौतम" वशिष्ठ' वगैरेत उल्लेख आढळतात. वृद्धहारीत स्मृतीत विष्णूंचे अवतार, त्याची आयुधे वगैरेची चर्चा आहे' विष्णू व विष्णुबिंब या बद्दल वृद्धगौतम वाधूल" वशिष्ठ भारद्वाज वृद्धहारीत वगैरेत बरीच माहिती आहे. इतर देवतांविषयी देखील अशीच माहिती सापडते.
येथेच आचारधर्मांशी संबंधित शुक्रनीति साखरे ग्रंथ, लक्ष्मीधराचा कृत्यकल्पतरु व हेमाद्रिच्या चतुर्वर्गचिंतामणि सारख्या संकलन ग्रंथाचा उल्लेख करणे ही अपरिहार्य आहे. कारण असले ग्रंथ म्हणजे वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या ज्ञानकोषाच्याच आवृत्त्या असल्यामुळे त्यांत मूर्तिशास्त्राविषयी सामग्रीसुद्धा समाविष्ट झालेली आहे. सोमेश्वर चालुक्याचा अभिलषितार्थचिंतामणि किंवा मानसोल्लास हा ग्रंथ देखील याच कोटीचा आहे. त्यात असलेले 'आलेख्यकर्म', 'मूर्तिलक्षणम्', 'चित्रलक्षणम्', वगैरे अध्याय फारच उपयोगी आहेत. विशेषकरून दक्षिण भारतातील मध्यकालीन मूर्तीचा अभ्यास करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 'श्रीतत्त्वनिधि' हा अशाच प्रकारचा दुसरा संकलन ग्रंथ आहे. यांतही बरीच प्रकरणें फार महत्त्वाची आहेत.

तंत्र वाङ्मय :
प्राचीन परिभाषेप्रमाणे वेद प्रामाण्याला स्वीकार करणारे आस्तिक व त्याचा अस्वीकार करणारे नास्तिक किंवा वेदबाह्य समजले जात. आज 'अस्तिक' व 'नास्तिक' या शब्दांची मूल्यें बदलली आहेत व त्यांचा अर्थ ईश्वराचे अस्तित्व मानणारे किंवा न मानणारे असा केला जातो. मूळांत या शब्दांचे असे प्रयोग होत नसत. या दंडकाप्रमाणे बौद्ध व जैन हे तर नास्तिक आहेतच, तसेच तंत्राम्नायांचे अनुगमन करणारे ही वेदबाह्य किंवा नास्तिक वर्गातच मोडतात. तंत्राविषयी लोकांच्या कल्पना बऱ्याचशा भ्रांत आहेत. तंत्रशास्त्राचा अर्थ म्हणजे लैंगिक सुख विषयक तत्वांना ब्रह्म व जीवात्मा यांच्या आध्यात्मिक ऐक्याचे गोंडस स्वरूप देऊन त्याच्या आड फक्त गोपनीयता, रहस्य, विलास, मदिरापान स्वेच्छाचार, मांसभक्षण इत्यादि गोष्टींचा पाठपुरावा करणारे शास्त्र असा सामान्यपणे समजला जातो. हे जरी काही अंशी खरे असले तरी ते पूर्ण सत्य नाही. तंत्रांत फक्त काही बीभत्स व लाजिरवाण्या क्रियांचाच विचार नसून गंभीर आध्यात्मिक चिंतन, योगशास्त्राचे निरनिराळे • प्रयोग, फार मोठा देवतासंघ व वाढीस लागलेली उपासना पद्धतीही आहे, पण या विषयाचा अधिक विस्तार आपणांस येथे करता येत नाही. आपल्याला फक्त मूर्तिशास्त्रांपुरतेच तंत्रवाड्मय हाताळावयाचे आहे.उत्तर भारतांत तंत्राच्या तीन प्रमुख धारा होत्या. वैष्णव, शैव आणि शाक्त. त्यापैकी वैष्णव तांत्रिक संप्रदायांचे आता स्वतंत्र अस्तित्व लुप्त होऊन त्याची वैदिक मतांत चांगलीच सरमिसळ झाली आहे. वैष्णवांची पंचरात्रोपासना वैष्णव तंत्राचे प्रमुख अंग आहे. आज आस्तिकांत सर्वत्र मान्य असलेल्या श्रीमद्भागवत या वैष्णवपुराणांवर 'नारदपञ्चरात्रा'ची छाया दिसते." पाञ्चरात्र वाङ्मयाचा स्वतंत्र विचार पुढे करू.
शैव व शाक्त तंत्राच्या विचारपद्धतीत थोडा भेद असला तरी सादृश्यही बरेच आहे. शैव तांत्रिक पद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'नाथसंप्रदाय' हा होय. आदिनाथ म्हणजे शिव, त्यापासून नाथसंप्रदायाची परंपरा सुरू झाली व पुढे मत्स्येन्द्र, गोरक्ष, जालंदर कानिफ वगैरे नाथ आचार्य पदांवर आले 'सिद्धसिद्धांत पद्धति' हा गोरक्षनाथ प्रणीत ग्रंथ या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ होय. बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थान इकडे व उत्तरपश्चिम भागांकडे हा संप्रदाय बराच फोफावला. याच्याशी संबंधित प्रतिमाही इकडच्या भागांत मिळतात.
शैव तंत्रापेक्षा आज ही शाक्त तंत्राचा बराच प्रचार आहे. बंगाल, बिहार, उडीसा, उत्तरप्रदेश, पंजाब, काश्मीर, पाकिस्तानाचा उत्तरी व अफगाणिस्थानांचा दक्षिण पश्चिमी भाग हा एवढा पट्टा एक प्रकारे शाक्तमताचे माहेरघर म्हणून ओळखता येईल. या संप्रदायाचे लोण दक्षिणेंत ही बरेच पोचलेले दिसते. शाक्तांचा मूर्तिशास्त्रांवर चांगलाच प्रभाव पडलेला आहे. मातंगी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, जयन्ती, यमघंटा, भद्रकाली वगैरे प्रतिमांचा उगम याच मतांत आहे. याच्या उपासना गोपनीय असल्यामुळे आजपर्यंत बरेचसे शाक्त वाङ्मय प्रकाशांत आलेले नसून बरेचसे लुप्त झाले आहे. कित्येक ग्रंथ आता उपलब्धच नसल्यामुळे त्यांच्यातली स्फुट उद्धरणे जी इतरत्र आलेली आहेत, त्यांचाच संग्रह करून दुधाचर्ची तहान ताकांवर भागवावी लागत आहे. प्रसिद्ध तंत्रशास्त्रज्ञ डॉ. गोपीनाथ कविराज यांनी 'लुप्तागम संग्रह' या नावांने अशी उद्धरणें गोळा करून वाराणसीहून प्रकाशित करण्याचे काम चालविले होते. इतरत्रही असे प्रयोग झालेले आहेत. कृष्णानंद आगमवागीश यांनी 'तंत्रसार' या नावांने संकलन ग्रंथ लिहिला आहे त्यांत रुद्रयामल, ब्रह्मयामल, शारदातिलक, कुञ्चिकामत वगैरे ग्रंथांतून बऱ्याचश्या तांत्रिक ध्यानांचा संग्रह केला आहे. असाच दुसरा ग्रंथ 'तंत्रार्णव' आहे.
शाक्ततंत्र व तत्संबंधित शाक्त प्रतिमा यांचा विचार करतेवळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षांत येते कीं सुमारे दहाव्या शतकानंतर या प्रकारच्या प्रतिमांची संख्या व त्यांचे उपप्रकार याची वाढ होऊ लागते व सुमारे तेराव्या शतकांपासून त्यांचा चांगलाच प्रसार झालेला दिसतो. थोड्या फार फरकाने शैव व वैष्णव तंत्रास ही गोष्ट लागू पडते.

पाञ्चरात्र मत व त्याचे वाङ्मय" : -
वासुदेवाची उपासनापद्धती पञ्चरात्र या नावाने प्रसिद्ध असून तिचे अनुयायी पाञ्चरात्र, सात्त्वत् किंवा भागवत या नांवाने ओळखले जातात. महाभारतात दिलेल्या परंपरेप्रमाणे" पाचरात्र शास्त्राचा उपदेश सर्वप्रथम नारायणाने नारदांस केला व नारदाने ते इतर ऋषींस सांगितले. परंपरेप्रमाणे पाञ्चरात्र शास्त्राचा उगम वेदाच्या 'एकायन' शाखेपासून आहे. ही एकायन शाखा म्हणजे शुक्लयजुर्वेदाची काण्व शाखा होय. एकायन शाखेच्या वाङ्मयांत आचार्य उत्पलाने उल्लेख केलेल्या पाञ्चरात्र श्रुती व पाञ्चरात्र उपनिषद् यांचा समावेश होत असावा. पांचरात्र वाङ्मयाचा विस्तार फार मोठा होता. या विषयाचा सखोल अभ्यास करणारे जर्मन विद्वान डॉ. श्रॅडर यांच्या मते पाञ्चरात्रांचे संहिता साहित्य सुमारे एक ते दीड लक्ष श्लोकात्मक असावे. श्री प्रश्न, विष्णुतिलक व इतर ग्रंथांच्या मते तर वाङ्मयीन विस्ताराचा हा पल्ला दीड कोट श्लोकांपर्यंत जातो. डॉ. श्रॅडर यांनी २१० पाञ्चरात्र संहितांची नावे गोळा केली आहेत. त्यांच्या मते या संपूर्ण साहित्याचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येईल :१) मूळ संहिता (उत्तर भारत)
२) वरील ग्रंथापासून उद्भूत् दक्षिण भारतीय ग्रंथ.
३) निरनिराळ्या पोट भेदांशी सम्बन्धित अलीकडचे उत्तर व दक्षिण भारतीय ग्रंथ.
पाञ्चरात्रांच्या संहिता ग्रंथांत 'सात्त्वत', 'पौष्कर' आणि 'जया' या संहिता प्राचीन आणि प्रामाणिक समजतात. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने 'अहिर्बुध्न्य संहिता', 'हयशीर्ष पाञ्चरात्र', 'जयाख्य संहिता' वगैरे ग्रंथ विशेष उपयोगी आहेत. यांचे निर्माण काल मात्र त्यांच्या अंतरंग व बहिरंग परीक्षणानंतरच ठरविता येतील. उदाहरणार्थ हयशीर्षाचा बराचसा भाग अग्नि पुराणाने उचलला आहे".
विष्णुमूर्तीच्या अभ्यासासाठी पाञ्चरात्रांशी संबंधित वैखानसागमही बराच उपयोगी आहे, पण हा आगम ग्रंथ दक्षिण भारतीय प्रतिमांकडे लक्ष पुरविताना याला हाताशी धरणे सोईचे होय. पाञ्चरात्र व शैव संहिताचे वर्ण्य विषय चार वर्गात वाटले जातात चर्यापाद, क्रियापाद, योगपाद व ज्ञानपाद। यापैकी मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने क्रियापाद हा महत्त्वाचा भाग होय. पण प्रत्येक पाञ्चरात्र संहितेत हे चार भाग असतातच असे नाही. साधारणपणे क्रियापाद व चर्यापाद यांना प्रामुख्य मिळालेले असते. प्रथम भागांत आचरणाच्या 'विधि'ची चर्चा असून दुसऱ्यांत मंदिर निर्माण, प्रतिमा प्रतिष्ठा, ध्यानें वगैरे विषयांची चर्चा असते.
शिल्प साहित्य :
साहित्याचा एक भाग असाही आहे ज्यांत 'शिल्प' हाच प्रमुख विषय आहे, अर्थात् त्याबरोबर प्रतिमा निर्माणांची माहिती आलीच. म्हणूनच शिल्पांचे विवेचन करणारे हे ग्रंथ कधी कधी बहुमोल माहिती देतात. सम्राट् भोजाचे 'युक्ति कल्पतरु' व 'समरांगणसूत्रधार', शिल्पकार मंडनांचे 'रूपमण्डन', मयाच्या नांवावर चालणारे 'मयमत्', श्री कुमारांचे, 'शिल्परत्न', श्री प्रसन्न कुमार आचार्य यांनी संपादन केलेला 'मानसार' हा विशाल ग्रंथ, काश्यपाचा 'काश्यपशिल्प', चितौडच्या महाराणा कुंभाचे वेळी मंडनाने लिहिलेला 'देवतामूर्तिप्रकरणम्' वगैरे ग्रंथ अध्ययनांकरिता अपरिहार्य होत. याच संदर्भात 'भुवनदेवाच्या' अपराजितपृष्छेचा उल्लेख देखील अपरिहार्य आहे. जरी मूळांत हा ग्रंथकार जैन असला तरी त्याने ब्राह्मण धर्मीय देवतांचे बरेच विस्तृत वर्णन केले आहे. विश्वकर्त्यांच्या नांवाने गाजणारे 'विश्वकर्मावतारशास्त्र' याचाही उल्लेख या प्रसंगाने करावयास हवा.
इतर संकीर्ण साहित्य : -
वर उल्लेखिलेल्या साहित्यांशिवाय इतर शास्त्राशी संबंध असलेले वाङ्मय देखील भारतीय मूर्तिशास्त्रांच्या अभ्यासाला उपयोगी पडते. काही उदाहरणे घेऊ. पाणिनीची 'अष्टाध्यायी' जिच्यात सुमारे चार हजार सूत्रे आहेत, आज प्रचलित असलेल्या संस्कृत व्याकरणाची आधारशिला आहे. हा व्याकरण ग्रंथ व ह्यावरील पंतजलिचे भाष्य त्यांत आलेल्या प्रसंगापात्त उल्लेखांमुळे मूर्तिशास्त्राच्या अध्ययनालाही उपयोगी पडतात." तसेच आयुर्वेदाचे 'चरकसंहिता' 'काश्पसंहिता' वगैरे ग्रंथातील बालचिकित्सेशी संबंधित असलेले रेवतीकल्प कौमारभृत्यादि अध्याय, कार्तिक स्वामी, माता व बालग्रह यांचे बद्दल बरीच माहिती पुरवितात. ज्योतिषाचार्य वराहमिहिराचा बृहत्संहिता हा ग्रंथ तर गुप्तकालीन मूर्तिशास्त्रावर चांगलाच प्रकाश टाकतो. वराहमिहिराच्या आधारावर मूर्तिशास्त्राच्या कित्येक परंपरांची प्राचीनता ठरवता येते.ब्राह्मणधर्मीय वाङ्मयाप्रमाणे बौद्धवाङ्मयाचा देखील उपयोग होता. थेरवादी साहित्याचा मूर्तिपूजेवर जरी प्रत्यक्ष विश्वास नसला तरी ब्रह्मा, शुक्र, मार, वगैरेची रूपवर्णने तिथे आढळतात व प्रत्यक्ष प्रतिमांशी ती ताडून पाहता येतात. महायान संप्रदायात तर देवता संघाचा चांगलाच विकास झाला. आदि बुद्ध, ध्यानी बुद्ध, बोधिसत्त्व, अवलोकितेश्वर, त्यांच्या निरनिराळ्या शक्ती, यक्षिणी, यक्ष असा बौद्ध देवतांचा बराच मोठा पसारा वाढू लागला व त्याबरोबरच निरनिराळ्या उपासना पद्धती व त्यांचे प्रतिमाशास्त्र ही अस्तित्वांत आले. पुढे वाममार्गांच्या संयोगाने बौद्धांकडे एक तिसरे 'यान' म्हणजे 'वज्रयान' उत्पन्न झाले व त्याबरोबर अनेक प्रकारच्या धारणा, साधनमाला अस्तित्वांत आल्या. या विषयांवर अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यापैकी आज बरेचसे लुप्त झाले आहेत. काहींची चीनी, तिब्बती व इतर बौद्ध देशांच्या भाषांत केलेली भाषांतरेच फक्त उपलब्ध आहेत. नेपाळ, तिब्बत व काश्मीरच्या धातुमूर्तीत बौद्ध देवतासंघाच्या मूर्तीचा चांगलाव साठा आहे त्यांना समजून घेण्याची साधने बौद्ध वाङ्मयांत विखुरलेली आहेत.
बौद्ध तंत्राचा जास्त प्रसार सिद्ध, नाथ आणि योगी यांच्यामुळे झाला. पी.सी. बागची यांच्या मते तंत्र आणि आगम वाङ्मय सहाव्या ते नवव्या शतकांत चालू होते. तांत्रिक विचारधारेचा उत्कर्षकाल सुमारे सात ते बाराव्या शतकांचे दरम्यान ठरवतात."
भारतीय वाड्मयांबरोबरच पूर्व व दक्षिणपूर्व देशांतील बौद्ध वाङ्मयाचा आढावा घेतला पाहिजे. ब्रह्मदेश, थायलण्ड, जावा, सुमात्रा, बोर्नियो इकडे पसरलेले साहित्य व प्रतिमा तुलनात्मक अभ्यासासाठी फारच उपयोगी आहेत. सुप्रसिद्ध विद्वान डॉ. रघुवीर व त्यांचे पुत्र डॉ. लोकेशचन्द्र यांनी प्रकाशांत आणलेले वाङ्मय या दृष्टीने उपयोगीले पाहिजे.
दक्षिणपूर्वेप्रमाणे उत्तर पश्चिमेकडील वाङ्मय देखील मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने हाताळले पाहिजे. सर ऑरेल स्टेन यांनी सुरू केलेले शोध कार्य आता चांगलेच बाळसे धरू लागले आहे. अलीकडे ताजकीस्तानांत झालेले शोध व इटलीच्या संशोधकांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे.
बौद्ध वाङ्मय फक्त बौद्ध प्रतिमाचेच अध्ययन करावयास उपयोगी ठरत नसून कधी कधी ब्राह्मण धर्माच्या मूर्तीवर देखील तिकडून ओझरता प्रकाश पडतो. उदाहरणार्थ 'सुत्तनिपाता'ची निदेस टीका लोक देवतांच्या अभ्यासाकरिता चांगलीच उपयोगी आहे. 'ललितविस्तारांसारखे' ग्रंथ देवघरांतील पूजेच्या देवप्रतिमाची यादी देतात. 'मज्जूश्रीमूलकल्पा' सारखे ग्रंथ तांत्रिकांच्या शिवोपासने संबंधी माहिती पुरवतात तर 'दीघनिकाया'चे आटानाटीय सुत्त व महामायूरीसारखी प्रकरणें यक्षांबद्दलचे बारीक सारीक तपशील सांगतात.
बौद्धांप्रमाणे जैन वाङ्मय देखील मूर्तिशास्त्राच्या अभ्यासासाठी सहाय्यक सिद्ध होते. जैनांचे मुख्य आराध्य म्हणजे चोवीस तीर्थंकर ज्यांना जिन किंवा केवली असेही म्हणतात. ह्यांच्या प्रतिमा लांछन भेद वगळले तर जवळ जवळ एकाच प्रकारच्या असतात. त्यांची बसण्यांची किंवा उभे राहण्याची पद्धत ही अगदी ठराविक आहे. झोपलेल्या जिन प्रतिमा कधीच मिळत नाहीत. त्यामुळे वाङ्मयात आलेले जिनबिंबाचे उल्लेख देखील एकाच साच्याचे आहेत असे जरी असले तरी जैनांचा देवतासंघ मात्र लहान किंवा निश्चित चौकटीतच बसणारा होता असे नाही. प्रत्येक तीर्थकाराचे लांछने, त्यांचे यक्ष, शासन यक्षिणी, देवता वगैरेचा पसारा मोठा असल्यामुळे यांच्या प्रतिमाबद्दल जैन वाङ्मयात भरपूर माहिती मिळते. या संदर्भात 'अंगविज्जा', 'नायधम्म कहाओ', 'रायपसेणिय सुत्त', 'पहृणवागरणीय', वगैरे ग्रंथांची नांवे घेता येतील. संस्कृत ग्रंथात 'अपराजितपृच्छेचा' प्रामुख्याने उल्लेख करावयास हवा.

लेख:
लेखांत शिलालेख, मूर्तिलेख, ताम्रपट, इष्टिकालेख वगैरेचा मुख्यत्वे करून समावेश होतो. मूर्तिशास्त्राच्या अध्ययनासाठी थोड्या फार परीने ह्या सर्वांचाच उपयोग होतो. पुष्कळदा असे होते की शिलालेख कोरविणारे लेखाच्या सुरवातीलाच आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून 'मंगल' करतात. या नमनात्मक श्लोकात कधी कधी त्या देवतेचे ध्यानही दिलेले असते. म्हणूनच तो भाग मूर्तिशास्त्रांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. एका काळातील अशाप्रकारच्या लेखांचे साकल्याने अध्ययन केले तर कोणत्या काळात व कोणत्या भागांत कोणती देवता लोकप्रियतेचा उच्चांक गाठीत होती याचा अंदाज लावता येतो. उदाहरणार्थ उत्तर भारतातील सुमारे पाचव्या-सहाव्या शतकापर्यंतचे लेख चाळले तर असे दिसून येते की नमनाचे श्लोक वराह, सूर्य, विष्णू, शंकर यांचे तर वर्णन करतात पण मांगल्याचा प्रतीक म्हणून समजला जाणारा गणपती याचा मात्र यात मुळीच उदो उदो आढळत नाही. पांचव्या शतकापूर्वी मिळणाऱ्या गणेश प्रतिमांची संख्या अगदीच सीमित आहे. या तथ्याची सांगड वरील गोष्टीशी घातली की हा निष्कर्ष साधारणपणाने काढता येतो की गाणपत्य सांप्रदायाची लोकप्रियता गुप्त काळापासून वाढू लागली व पुढील काळांत तिने उच्चांक गाठला.मोठमोठाल्या शिलालेखांप्रमाणे मूर्तीच्या पीठावर कोरलेले लेख पुष्कळदा मूर्तीची ओळख पटवितात. याचे एक दोन नमूने पहा. जैनांच्या चोवीस तीर्थकारांची लक्षणे किंवा लांछने कुषाण काळात म्हणजे इसवीसनांच्या सुरवातीच्या शतकांत निश्चित झालेली नव्हती. त्यामुळे निरनिराळ्या तीर्थकारांच्या प्रतिमा स्पष्टपणे ओळखणे कठिण होणार होते. साहाजिकच त्यांना घडविणाऱ्या त्या वेळेच्या लोकांनी प्रतिमेच्या वाहिकेवरील लेखांत स्पष्टपणे नावाचा उल्लेख केलेला आहे. मथुरेहून मिळालेल्या बऱ्याच कुषाण कालीन तीर्थकार प्रतिमा अशा प्रकारच्या आहेत. मूर्तीवर लेख लिहिण्याची पद्धत पुढेही चालत राहिली व कित्येक जागी अजूनही आहे. पालकलेच्या पाषाणमूर्ती, नेपाळच्या धातुप्रतिमा, मध्य भारत, गुजराथ, राजस्थान महाराष्ट्र इकडील जैनांच्या अष्टधातू, पितळ, तांबे किंवा इतर बहुमूल्य धातूंच्या प्रतिमा कित्येकदा लेखांनी युक्त असतात. हे सर्वच लेख मूर्तिशास्त्रांच्या दृष्टीने उपयोगी असतात असे मात्र नाही.

नाणी : -
कित्येक राजवंशाची नाणी मूर्तिशास्त्राचा अभ्यास करण्यास बरीच मदत करतात. पांचाल, अयोध्या, वगैरे जनपदांत पूर्वी चालू असलेल्या काही नाण्यांच्या वर राजाच्या नावात द्योतित असलेली देवता दाखवीत असत. उदाहरणार्थ अग्निमित्राच्या नाण्यांवर अग्नि तर विष्णुमित्राच्या नाण्यांवर बारकासा विष्णू दिसतो. कुषाणांनी तर या बाबतीत फारच मोठी मजल गाठली. नंदीसह उभा असलेला किंवा एकटा नारीश्वर, सूर्य, चंद्र, वायु, वगैरे कित्येक देवांचे त्यांच्या नाण्यांवर अंकन झालेले आहे. यौधेयच्या नाण्यांवर कार्तिकस्वामी दिसतो. गुप्तांच्या सोन्याच्या नाण्यांवर सिंहवाहिनी देवी, स्कंद, विष्णू, लक्ष्मी, वगैरेंची भरघोस दर्शन घडते. देवतादिकांना नाण्यांवर अंकित करण्याची परंपरा पुढेही चालू होती. उदाहरणार्थ भोजांच्या नाण्यांवर वराह दिसतो. एकूण विविध राजवंशाच्या नाण्यांवर दिसणाऱ्या या देव प्रतिमा काही बाबतीत फारच उपयोगी सिद्ध होतात.लखोटे किंवा त्यासारख्या इतर वस्तूंस मोहरबंद करण्याकरिता जुन्याकाळी चिकट ओल्या मातीचा उपयोग करीत. अशा प्रकारची 'मुद्रांकित' पर्ने मालकाने उघडल्यानंतर त्यावर पाठविणाऱ्याने लावलेले मातीचे छाप किंवा ठसे अर्थातच निरुपयोगी म्हणून टाकून देत. हे छाप (Sealings) व ते उमटविण्याकरिता वापरले जाणारे शिक्के (Seals) साधारणपणे मातीचेच असत. निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या खोद कामांत अशाप्रकारचे बरेच छाप व शिक्के मिळाले आहेत. याच वर्गात मातीच्या तयार केलेल्या गोल किंवा चौकोनी आकाराच्या सपाट पदक वजा वस्तूही मोडतात. त्या मोठ मोठे महन्त, मठ किंवा मंदिरेयाकडून भाविक भक्तास प्रसाद म्हणून वाटल्या जात असत. या सपाट तुकड्यांवर मठाचे चिन्ह, देवमूर्ती, काही विशिष्ट मंत्र, वगैरे उमटलेले असतात. मूर्तिशास्त्राच्या अध्ययनांसाठी मातीच्या या सर्व वस्तू उपयोगी आहेत. काही उदाहरणे म्हणून खालील नोंदी महत्त्वाच्या वाटतील :
१) सिंधू संस्कृतीच्या उत्खननांत मिळालेल्या मुद्रा ज्यावर मातृदेवी, वृक्षदेवता, पशुपति (शिव) नाग, वगैरेचे दर्शन घडते.
२) मातृदेवीचे निरनिराळ्या प्रकारे अंकन करणाऱ्या मातीच्या मौर्यकालीन चकत्या. अशा चकत्या रूपड, तक्षशिला, मथुरा, काशी पटना, वगैरे ठिकाणी मिळाल्या आहेत. सर्वांत अधिक म्हणजे एकवीस चकत्या बिहार राज्याच्या मूर्ताजीगंज येथून मिळाल्या आहेत.
३) बसाढ (बिहार) व भीटा (उत्तर प्रदेश) येथून मिळालेल्या मातीच्या छापांत बऱ्याच ठिकाणी शिवाचे व लक्ष्मीचे अनेक प्रकारे अंकन केलेले आहे. हे छाप गुप्त काळाचे किंवा त्या जवळपासचे आहेत.
४) उत्तर गुप्तकाळात नालंदा येथे फार मोठे बौद्ध केंद्र होते. येथून स्तूप व लेखांकित बरेच छाप मिळाले आहेत. काही ब्राह्मण धर्माशी संबंधित आहेत.
मातीच्या या विविध वस्तूंवर उमटलेल्या देवप्रतिमा देवतेच्या रूपांबरोबरच विशिष्ट संप्रदायाची प्रसारमर्यादाही ओळखण्यास मदत करतात.
चित्रे : -
या वर्गात भांड्यावरील चित्रे, खांब, भिंती, गर्भगृहे किंवा मंदिरे व सभागृहाच्या छतांवर काढलेली चित्रे, तशीच हस्तलिखित ग्रंथाची आवरणे, मलपृष्ठे किंवा पानें, तसेच निरनिराळी पटचित्रे किंवा चित्रपट यांचाही समावेश होतो. जर ही चित्रं चांगल्या स्थितीत टिकलेली असली तर देवतेच्या रूप व वाहनांप्रमाणेच तिच्या वर्णाचीही सहज ओळख पटते. या दृष्टीने मध्य आशियातून मिळालेली ग्रंथ चित्रे, अजिंठा, बाग, पट्टडाकल वगैरे स्थानाची भित्तिचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. खोतान येथील ग्रंथचित्रांत शिव, इंद्र, विष्णू, वगैरेची मध्य आशियांत रुढ असलेली रूपें पाहतां येतात. अजिंठा येथे बुद्धाचे जीवन चित्रित केलेले आहे; तर लेपाक्षीची रंगीत चित्रे रामायण महाभारताशी संबंधित आहेत.
कलाकुसरीच्या वस्तू : -
सरतेशेवटी भांडी, खेळणी, सिंहासने, मखरें, देव्हारे, देवपाट, पिछावाया किंवा पडदे, हस्तिदंती किंवा चंदनी पेट्या, सोन्या चांदीची उपकरणी, दारांच्या चौकटी, वगैरे त-हेत-हेच्या कलाकुसरीच्या वस्तूंकडे ही लक्ष पुरविले पाहिजे.अशा प्रकारच्या अनेक नमुन्यांवर गणपती, नवग्रह, इष्ट देवता व तिचा परिवार, इष्ट देवतांची वाहने वगैरे अंकित केलेली असतात. कलेच्या आधारावर या वस्तूंचा निर्माण काल ठरविता येतो. त्यामुळे तेथे असलेल्या देवप्रतिमेचाही काल सहज ठरतो. अर्थात्व या प्रकारे कलाकुसरीच्या या वस्तू जरी स्वतः पूजेची प्रतिके नसल्या, तरी विशिष्ट संप्रदायाची वाढ कशी होत गेली हे सांगण्यास बरीच मदत करतात.
प्रतिमा :
हे तर मूळच होय. निरनिराळ्या माध्यमांच्या मदतीने पूजेकरिता केलेल्या प्रतिमा व्यतिरिक्त गोपुरे, भिंती, दारे, खांब, किंवा इतर भागास श्रृंगारण्याकरितां केलेल्या मूर्ती तशीच हजारोच्या संख्येत सापडणारी खेळणी या शास्त्राच्या अभ्यासांकरितां बहुमोल सामग्री उपस्थापित करतात.भारतीय मूर्तिशास्त्राचा विकास कसा झाला, इतर संस्कृतीची त्यावर काय छाप पडली, किंवा त्याने इतरांस काय दिले, जुन्या देवता कशा मावळत गेल्या व त्यांचे ठिकाणी नव्यांची स्थापना कशी झाली, मूर्तिपूजेचा विरोध करणारे जैन व बौद्ध तिच्या आहारी कसे गेले, देवप्रतिमेने संपूर्ण भारताच्या मनाची कशी घट्ट पकड घेतली वगैरे विषयांचे अध्ययन वरील साधनांच्या मदतीनेंच करता येणे शक्य आहे.

मूर्तिविज्ञान व त्याची उपादेयता :
शास्त्रीय दृष्टिकोनांतून पाहिल्यास 'मूर्ती' किंवा प्रतिमेपेक्षा 'अर्चा', 'बेर' व 'विग्रह' हे शब्द अधिक सार्थ वाटतात. कारण त्यांत उपासनेचा किंवा पूजेचा संबंध स्पष्ट होतो. या दृष्टीने प्रतिमा व अर्चा यांतील फरक लक्षांत घेणें अगत्याचे आहे. कलेच्या क्षेत्रांत एक देखणी व भावपूर्ण मूर्ती कलाकाराचे शेवटले साध्य असू शकते. पण उपासनेच्या क्षेत्रांत मनाला वेधून घेणारी अर्चा फक्त एक साधन असतें साध्य नव्हे. कलेच्या पूर्णतेकरितां धार्मिक भावनेचे अधिष्ठान असणें अपरिहार्य नसते, पण 'अर्चे' च्या पूर्णतेसाठी मात्र ते अपरिहार्य असते. याचाच अर्थ असा कीं 'अर्चेला' विशिष्ट संप्रदायाच्या ठराविक साच्यात बसणें अत्यावश्यक आहे. अर्थातच साधारण मूर्तिकाराला कलेच्या स्वैरपणें संचार करावयास मिळतो, तितका अर्चाकाराला मिळत नाही. त्याला फक्त 'आत्मसंतोषार्थ' कार्य करावयाचे नसून खऱ्याखुऱ्या अथनि 'बहुजन हिताय' व 'बहुजनसुखाय' झिजावयाचे असते.अर्चाकारासाठी घालून दिलेले नियम व दण्डक कधीकधी त्याच्या वैयक्तिक जीवनांस देखील अखडून टाकतात. 'अर्चा' घडवीत असताना त्याला माध्यमाचा विचार करावा लागतो, देश, काल व शास्त्र इकडे फार बारकाईने लक्ष पुरवावे लागते व अर्चेचा प्रारंभ झाल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत निश्चित अशा मयदित स्वतःला अडकवून घ्यावे लागते. उदाहरणार्थ तिबेटच्या परंपरेप्रमाणें 'थान्का' नांवाच्या चित्रपटाचे अंकन करणाऱ्या चित्रकाराला डोळ्यासमोर आलेख्य मूर्ती यावी म्हणून विशिष्ट प्रकारची उपासना करावी लागते. एकूण साधारण मूर्तिकारापेक्षा अर्चाकाराचे क्षेत्र संकुचित असून अनेक बंधनानें जखडलेले आहे. ह्या तपः पूत कार्याची फळे म्हणजे सगुणांत निर्गुणाचा साक्षात्कार घडवून आणणाऱ्या देव प्रतिमा होत. ठळक नमूने म्हणून मथुरा व सारनाथ (वाराणसी) येथील कृषाण व गुप्तकालीन बुद्ध प्रतिमा, अहिच्छत्रा येथून मिळालेल्या गंगा-यमुना व शिवपार्वतीच्या मातीच्या मूर्ती, अजिंठ्यात दिसणारा करुणाशील बोधिसत्त्व पद्मपाणि, इत्यादि कलाकृतीची नांवे घेता येतील.
अशा प्रकारच्या सुंदर कलाकृतींनी भारतीय मनाची पकड घेतली याचे कारण फक्त त्याचे कलेबद्दलचे प्रेम नसून,या देशाची अध्यात्मिक विचार परंपरा हे आहे. भारतीय विचारवंताचे मन केवळ बाह्य सौंदर्यावर भुलत नसून ते आंतरिक सौदर्याचा रसास्वाद घेण्यांस आसुसलेले असते. ते दगड, माती, धातू, वगैरे माध्यमांची पूजा करीत नसून, त्यामध्ये प्रतिष्ठित केलेल्या अनाकलनीय शक्तीची उपासना करीत असते. म्हणूनच पंढरीचा विठोबा, नर्मदेचे पाषाण, काळेभोर शाळिग्राम, किंवा बटबटीत डोळ्यांची शेंदूर फासलेली देवी उपासकाचे मन गुंगवू शकते.
भारतीय विचारधारेप्रमाणे उपासनेचे लक्ष्य निर्गुण परब्रह्माशी एकात्मक संबंध स्थापन करणे हे आहे. सगुण उपासनाही निर्गुणापर्यंत जाण्याची पायरी आहे. सगुणोपासनेचे प्रतीक 'अर्चा' चालू भाषेत मूर्ती हे होय. जैन बौद्ध वगैरे नास्तिक मतांच्या आचार्यांनी मूर्तिपूजेबद्दल कोणतीही आस्था दाखविली नाही, पण त्यांचा स्याद्वाद व शून्यवाद भोळ्या भाबड्या लोकांच्या आटोक्यात येणारा नव्हता. त्यांना असे काही तरी हवे होते. त्यामुळें प्रथम स्तूप, भिक्षापात्र, प्रभामंडल, बोधिवृक्ष अशी प्रतीके आली व लवकरच त्यांचे स्थान आचार्यांच्या मूर्तीनेच ग्रहण केले. बुद्ध, बोधिसत्त्व, जैन तीर्थकार हळुहळु उभय मतांचा देवतासंघही फोफावला व प्रतिमांची पकड चांगलीच घट्ट झाली. ब्राह्मणधर्माने तर अगोदरच मूर्तीना प्रश्रय दिला होता. त्यामुळे मूर्तिविज्ञानाला आसेतुहिमाचल व्यापकता मिळाली व ते भारतीय जन जीवनांचे अभिन्न अंग झाले.

मूर्तिविज्ञानाचा अभ्यास :
जोपर्यंत त्यात मूर्तिविज्ञानाचा समावेश होत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृती इतिहास व कलेचा अभ्यास पूर्ण होणार नाही. या उलट मूर्तिविज्ञानाचा पूर्ण अभ्यास करण्यांकरिता भारताच्या प्राचीन व अर्वाचीन भाषा, त्याचा इतिहास येथे विकास पावलेल्या निरनिराळ्या मतमतान्तराचे अन्तरंग व बहिरंग परीक्षण, चालीरितीचे सूक्ष्म अध्ययन वगैरे फार बारकाईने करावयास हवे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे भारतीय मूर्तिविज्ञान व भारतीय संस्कृती यांचा अन्योन्याश्रय संबंध आहे. म्हणूनच मूर्तिविज्ञानाचा अभ्यास करताना प्रत्येक पायरीवर देश, काल व परिस्थितीकडे लक्ष पुरविले पाहिजे. काही उदाहरणे घेऊन हा विषय स्पष्ट करू.प्रथम देशाचा विचार हवा. उत्तरभारतीय सूर्य प्रतिमांचा पोषाख इराणी आहे. सूर्याने पायांत उंच बूट घातलेले दाखवितात. वास्तविक आपल्या नित्यपूजेत जोड्यांचा काही ही संबंध नाही. ते बाहेरच ठेवावयाचे असतात. सूर्याच्या जोड्यांची चर्चा मात्र महाभारतादि प्राचीन ग्रंथांत ही आढळते. तेथे सूर्याच्या उघडपायाचे पूजन अवैध सांगितलेले आहे. या उलट दक्षिण भारतात सूर्यप्रतिमेचा जोड्याशी संबंध दिसत नाही. तेथें इतर प्रतिमाप्रमाणेच सूर्याचेही पाय उघडे असतात. देशभेदाचे दुसरे उदाहरण शिवमूर्तीत पहावयास मिळते. उत्तरभारतात दिसणारा त्रिशूलधारी शिव दक्षिणेंत 'परशुमृगांकित' दिसू लागतो. अर्धनारीश्वराच्या 'ऊर्ध्वलिंगयुक्त' मूर्ति उत्तरेत दिसतात तर दक्षिणेंत शिवताण्डवाचा जास्त प्रचार आहे. सोमास्कंद, मार्कण्डेयानुग्रह, वगैरे शिवमूर्तीचे प्रकार उत्तरेत क्वचित आढळतात. कार्तिकस्वामीसारखे काही देव उत्तरेतून दक्षिणेत गेले व तेथेंच स्थायी झाले. मोहिनीपुत्र शास्ता या सारखे देव दक्षिणेत विकास पावले व तेथेच रमले, उत्तरेत त्यांना ओळखणारे फारच थोडे.
देशाप्रमाणे कालानेही मूर्तिविज्ञानाला चांगलेच प्रभावित केले आहे. विष्णूच्या आयुधात कमळाचे आस्तित्व गुप्तकाळापर्यंत मुळीच दिसत नाही. त्याऐवजी उजवा हात अभयमुद्रेत दिसतो. पुढे काही काळापर्यंत विष्णूच्या या हातात फळ किंवा जपमाळ दिसू लागते व पुढे कमलाचे दर्शन घडते. मध्यकाळांत तर शंख, चक्र, गदा व पद्य यांच्या स्थान परिवर्तनांचे आधारावर विष्णूच्या चोवीस प्रकारच्या मूर्ती घडविल्या जाऊ लागल्या. विष्णूची अवतार कल्पना देखील कालमानाने चांगलीच प्रभावित आहे. आठापासून एकोणचाळीस अवताराची नांवे सांगणाऱ्या याद्या वाङ्मयांत आढळतात. हळूहळू मुख्य अशा दहा अवतारांनाच लोकमान्यता मिळाली, पण त्यांत देखील मतभेद राहिलेच व त्या प्रमाणेंच मूर्तीचे अंकन होत असे. कित्येक ठिकाणी आठवा अवतार म्हणून कृष्णाला न दाखवता बलरामाला दाखवीत बिहार व बंगाल मधें गुप्तोत्तश्र काळांत नववा अवतार चीवर व संघाटी असलेल्या शाक्त बुद्धाचा असतो, तर महाराष्ट्रांत त्या ऐवजी बऱ्याच ठिकाणी पांडुरंग किंवा जगन्नाथ दिसतात.
काल भेदाने देवांच्या लोकप्रियतेत देखील चढउतार होत असतो. एके काळी ब्रह्मदेवाची उपासना चांगलीच मान्य होती, पण पुढें हा देव अपूज्य मानला गेला. कामदेवाच्या मंदिरांचे व उत्सवांचे उल्लेख संस्कृत वाङ्मयात बरेच आढळतात. त्याच्या मातीच्या व दगडाच्या प्रतिमांही शुंगकाळात रूढ होत्या, पण पुढे परिस्थिती बदलत गेली. गुप्तकाळात वराह व कार्तिकेय यांचे पूजन लोकप्रिय होते. हळूहळू त्या लोकप्रियतेला ओहोटी लागली व आज तर उत्तर भारतात या देवतांच्या प्रतिमा क्वचितच घडवितात. या उलट गणपतीची स्थिती आहे. गुप्तकाळापर्यंत हा देव असून नसून सारखा होता. पण मध्यकाळापर्यंत येता येता याची लोकमान्यता शिगेला पोहोचली. कोणत्याही मंगलकार्यात गणपतीचे स्मरण केल्याशिवाय कधीही पाऊल पुढें पडत नाही.
देश व कालाप्रमाणेंच मूर्तिविज्ञानाच्या विद्यार्थ्याने निरनिराळ्या संप्रदायाच्या परस्पर संबंधांकडे ही कसोशीने लक्ष द्यावयास पाहिजे. आपला संप्रदाय किंवा पंथ सर्वश्रेष्ठ होय हे दाखविण्यांसाठी इतर विरोधी मतांच्या देवांना किंवा देवींना आपल्यात मिळवून घेणें किंवा त्यांना गौणस्थान देणें ही अगदीच साधारण व सामान्य गोष्ट होती. मुळांत ब्राह्मण धर्माशी सम्बद्ध असलेली गोमुख यक्ष, अंबिका, वासुदेव, बलभद्र, वगैरे मंडळी जैन तीर्थकरांचे शासनदेव किंवा शासनदेवी झालेली आढळतात. ब्राह्मणांचा गणपती तिबेटचा महायानी देव विध्नान्तक याच्या पायाखाली चिरडला जाताना दिसतो, तर ब्राह्मणधर्मीय शिवशक्ती तेथे 'चक्रसंवर' हे रूप घेतलेले दृश्यमान होतात. या उलट जैनांचा आदितीर्थंकर ऋषभ व बुद्ध हे विष्णूच्या अवतारांत सामिल झालेले दिसतात.
या प्रमाणे एकाच मताच्या पोटभेदांचेही एकामेकांवर परिणाम झालेले दिसतात. चिताभस्म व व्याघ्रांबर धारण करणाऱ्या वैराग्यमूर्ती शिवाला मध्यकाळांत विष्णूप्रमाणेच निरनिराळ्या दागिन्याने अभिमंडित दाखवू लागले. या उलट शैवांची नक्कल म्हणून वैष्णवांनी आपल्या विष्णूच्या आलिंगन, कल्याणसुंदर, अर्धनारी, वगैरे प्रकारच्या मूर्ती घडविल्या. शिव व विष्णू प्रमाणे काही गणेशभक्तांनी देखील आलिंगनमूर्ती तयार केल्या, तर विष्णुधर्मोत्तरपुराणाच्या आधारे सपत्नीक इंद्र व सपत्नीक वरुण दिसू लागले.
या प्रमाणे मूर्तिशास्त्रांत एकीकडे एकामेकांची नक्कल व पाणउतारा करण्याचे प्रयत्न चालू असता, दुसरीकडे परस्पर विरोधी मतांत सामंजस्य स्थापित करण्याचे ही यत्न चालू होते. शिव व विष्णूची एकरूपता दाखविण्यासाठी हरि-हर प्रतिमा समोर आली. मध्यकाळांत ब्राह्मणधर्मांत प्रमुख रूपाने शैव, वैष्णव, शाक्त, सौर व गाणपत्य या मतांचे स्थान होते. यातील परस्पर विरोध टाळण्याकरिता स्मार्तानी पंचदेवोपासना समोर आणली, व काही शिवालिंगात चहुबाजूस शिव, सूर्य, विष्णू व ब्रह्मदेव दिसू लागले. दुसऱ्या प्रकारच्या सर्वतोभद्र प्रतिमांत सूर्य, कार्तिकेय, विष्णू, वराह, हरिहर, शिवपार्वती, वगैरे एकत्र आढळतात. सामंजस्याचा संकेत करणाऱ्या अन्य प्रतिमा म्हणजे हरि-हर सूर्य, हरि-हर-सूर्य- पितामह, हरि-हर-सूर्य-बुद्ध, सूर्य-लोकेश्वर, विष्णू-लोकेश्वर आदि होत.
.jpg)
मते व संप्रदाय यांचा विचार करतांना तंत्राकडे ही लक्ष पुरविले पाहिजे. भारतीय आध्यात्मिक विचार धारेवर तंत्रमार्ग किंवा वाममार्गाचाही चांगलाच प्रभाव पडलेला आहे. वाममार्गाचे एक वैशिष्ठ्य त्याची गोपनीयता हे आहे. पञ्च मकाराचा अवलंब करणारे शाक्त, कौल, कापालिक यांना स्वमताच्या स्थापनेचा उघड उघड प्रयत्न करता आला नाही, कारण त्यांना मान्य असलेल्या कित्येक गोष्टी शिष्ट समाजाला सहज पचणाऱ्या नव्हत्या. तंत्र मार्गाच्या प्रतिमांचे दर्शन ही सर्व सुलभ नसते. 'चक्र' किंवा मण्डलांत त्यांचे पूजन करीत असतात. मूर्तिकलेच्या क्षेत्रांत उच्छिष्ठगणपती, योन्यधिष्ठित शिवलिंग, छिन्नमस्ता, तिब्बती गुह्य समाज, चक्रसंवर, यव-युम्, वगैरे प्रतिमांची पूर्ण ओळख तांत्रिक पार्श्वभूमिचा चांगला परिचय असल्याशिवाय पटणें शक्य नाही.
भारतीय मूर्तिविज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांना येथील इतिहास, दर्शन, वाङ्मय व सामाजिक परंपरा वगैरे विषयांचे सखोल परीक्षण करणे कसे आवश्यक आहे याचा आपण येथपर्यंत विचार केला पण याचे क्षेत्र येथेच संपत नाही. हजारो वर्षांपासून रुढ असलेल्या भारतीय परंपरांनी कित्येक विदेशी परंपरावर आपली छाप टाकली व कित्येकदा स्वतः त्या ही दुसरीकडून प्रभावित झाल्या. भारतीय विचारधारा मायभूमीची सीमा ओलांडून तिबेट, चीन, कोरिया, जपान, मध्यएशिया, अफगाणिस्तान, लंका, थायलंड, इंडोनेशिया, वगैरे भागांत पसरल्या. जरी त्यांचा तिकडील परंपराशी सरमिसळ झाला असला तरी बऱ्याच ठिकाणी त्यांना स्वतंत्रपणे ओळखता येणे शक्य आहे. साहाजिकच येथून मिळणाऱ्या प्रतिमावर भारतीयतेची छाप उमटलेली दिसते. भारतांचे अगस्तिसारखे काही मुनी इतरत्र आराध्य देव म्हणून गाजतात. काही ठिकाणी भारतीय देवतांची रूपे बदललेली दिसतात. उदाहरणार्थ आपल्या गणपतीची चीन, तुर्कस्थान, कोरिया व जपान येथील रूपे पहा. कंबोडियाचा हरिहर आपला वाटत नाही, तर चंपादेशांतील बीन्ह-डीन्ह आणि कुंग अर्थात् बुद्ध आणि शिव चटकन ओळखता येत नाहीत.
जसे आपण बाहेर गेलो तसेच बाहेरचे ही कित्येक देव आपल्याकडे आले. काहींनी आपली नावे व रूपे बदलली. कुषाणकाळात वायव्येकडून आलेले ऑरडोक्शो आणि फॅरो गांधार कलेत हारिती आणि कुबेर झाले, त्याचवेळी माथुरी कलेत हारितीला मातृकावर्गात स्थान मिळाले.
'माओ' हे नाव धारण करून चंद्र पुरुषरूपांत प्रविष्ट झाला तर 'हेलिओस' हे नांव घेऊन सूर्याने भारतात प्रवेश केला. त्याने 'हेली' हा सूर्यवाचक शब्दही संस्कृत कोशांत दडपून ठेवला." याचप्रमाणे कुषाणकाळात दिसणाऱ्या शिव, विष्णु, बुद्ध, मैत्रेय, बोधिसत्व, वगैरेच्या मिशा, देवीच्या हातात दिसणारे 'निधिश्रृंग' किंवा कार्नुकोपिया, शिवाचे खट्वांग, विष्णूची हरक्यूलियन क्लब (Club) सारखी दिसणारी गदा, वगैरे मुळात भारतीय नाहीत. यापैकी काहींनी आपली रूपे पुढे बदलली व काही पूर्णपणे डोळ्याआड झाले.

मूर्तिविज्ञानाचा उपयोग :
वर उल्लेखिलेल्या निरनिराळ्या विषयांच्या मदतीने जर मूर्तिविज्ञानाचा अभ्यास केला तर तो कित्येक दृष्टीने फायदेशीर होतो. भारतीय इतिहासाच्या प्रत्येक युगांत धर्माचे प्राधान्य रहात आले आहे. मुसलमानांना वगळले तर ज्या ज्या परदेशी शक्तीसमोर रणांत भारताला पड खावी लागली, त्या प्रत्येक शक्तीला त्याने सांस्कृतिक क्षेत्रात विजित केले. ग्रीक, शक, कृषाण आणि हूण यांनी भारतीय भूमी पायाखाली तुडविली पण त्या बरोबरच याच विजेत्यानी विष्णू, शिव, बुद्ध यासारख्या भारतीय देवता समोर आपले डोके लवविले. इतिहासजमा झालेल्या या घटनाचे मूर्तिशास्त्रात प्रत्यक्ष दर्शन घडते. विष्णूकडून वर मागणारा परदेशी राजा, शिवलिंगाचे पूजन करणारे कुषाण पुरुष, मूर्ति कलेत पाहता येतात.मध्यएशियात मिळालेली ग्रंथ-चित्रे आपण आपल्या सीमेच्या बाहेर कितपत प्रभाव टाकू शकलो याची कल्पना देतात. याशिवाय मूर्तिशास्त्रामुळे लोकमानसाच्या निरनिराळ्या आणि विचित्र छंदाचेही दर्शन घडते. उदाहरणार्थ अश्लीलतेपासून दूर असणाऱ्या ब्राह्मण समाजाने काळाच्या ओघाने उत्पादनाचे प्रतीक योनिपीठ व त्यावर स्थित शिवलिंगाला इतकी मान्यता दिली की ते शंकराच्या प्रतिमेला मागे टाकून शिव पूजेचे एकमेव प्रतीक होऊन बसले. दुसरे उदाहरण म्हणजे इराणी पद्धतीच्या सूर्य प्रतिमांनी समाजावर एवढी जबरदस्त छाप टाकली की सोवळ्याचा उदो उदो करणाऱ्या सनातनी लोकांनी देखील कमीत कमी उत्तर भारतात उंच जोडे घातलेली सूर्य मूर्तिपूजेत प्रतिष्ठित केली, तसाच पोषाख घातलेले सूर्याचे पिंगलादि अनुचर मान्य करून घेतले एवढेच नव्हे तर त्याच्या जोड्यांना शास्त्रीय बैठक देण्याकरिता सूर्याच्या उघड्या पायाचे दर्शन व पूजन अवैधच ठरवून टाकले. या गोष्टींच्या कारणपरंपरेचा विचार केला असतां असे दिसून पडते की विशिष्ट परिस्थितीत उत्पन्न झालेल्या किंवा स्वीकार केलेल्या काही गोष्टी जनमानसाची इतकी घट्ट पकड घेतात की ती परिस्थिती बदलल्यानंतर देखील त्याच्या मगरमिठीतून लोक सुटत नाहीत. असे होऊ लागले म्हणजे रुढीच्या बलावर त्यांना शास्त्र शुद्ध स्वरूप मिळून मुळात विकृत वाटणाऱ्या गोष्टी देखील समाजात चांगल्याच रूळतात. कुषाणकालीन इराणी सूर्याचे हळूहळू भारतीय करण तर झाले पण त्याचे जोडे मात्र पुढे कित्येक शतकांपर्यंत तसेच चिकटून राहिले, किंबहुना या मुळात परदेशी वस्तू आहेत हेही लोकमानसाच्या पटावरून साफ पुसले गेले.
मूर्तिविज्ञानाच्या अध्ययनाने लोकधर्माच्या पसाऱ्याची देखील चांगलीच कल्पना करता येते. जेव्हा अविकसित किंवा अर्धविकसित संस्कृती एखाद्या पूर्ण विकसित सभ्यतेच्या संपर्कात येते तेव्हा प्रकृतीच्या नियमाप्रमाणे पहिली (अर्थात् अर्धविकसित किंवा अविकसित संस्कृती) आपले वेगळे अस्तित्व विसरून दुसरीत मिसळते. तरी पण तिची काही वैशिष्ट्ये चिरकाळापर्यंत दम धरून असतात. उदाहरण म्हणून शबर सभ्यतेकडे पाहू. आज 'आदिवासी' म्हणून ओळखले जाणारे बहुसंख्यक लोक एके काळी प्रसिद्ध असलेल्या खस, पुलिंद, भिल्ल, शबर, किरात, कोल या निरनिराळ्या जातींशी संबंध होते. शबरांना आज 'साबरा' म्हणून ओळखतात. उडीसा, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूच्या काही भागात वस्ती करून असलेल्या साबरात आज राम, जगन्नाथ, चंद्र वगैरे शिष्ट संस्कृतीच्या देवाबरोबरच कितुंग, उमुंगसुम, आदि जुने देव देखिल तग धरून आहेत. सारांश सर्वत्र लोकधर्म, लोक गीते, लोककथा या रूपांत मूळाचे देव व त्याची धार्मिक कृत्ये जिवंत राहतात व त्यामुळे मूर्तिविज्ञानांतही त्यांचा शिरकाव झालेला असतो.

असे होणे अपरिहार्य होय हे प्रत्येक शिष्ट सांस्कृतिलाही कळते व म्हणूनच ती या प्रकारच्या देवतांच्याकरिता आपल्या येथे वेगळे गौण रूपाचे स्थान देत असते. ब्राह्मण, जैन व बौद्ध धर्माच्या पूर्ण विकसित देव परिवाराकडे नजर टाकली म्हणजे वरील विधानाचे सत्यत्व सहज पटते. यक्ष नाग, राक्षस, भूत, वीर, वगैरे अविकसित संस्कृतीची दैवते या तिन्ही धर्मात अनुचर देवतांच्या रूपाने समाविष्ट केली गेली. कार्तिकस्वामी काळात 'देवसेनापति' झाला तर राक्षसराज कुबेर याला लोकपालात स्थान मिळाले.
मूर्तिविज्ञानाने जुन्या ग्रंथात प्रयुक्त झालेल्या कित्येक शास्त्रीय शब्दांचे नेमके अर्थ स्पष्ट होऊ शकतात. ते कोषातून कळण्यास मार्ग नसतो. एक दृष्टांत देतो. पुराणादि प्राचीन ग्रंथात प्रतिमा लक्षणें सांगत असतांना 'देव दुन्दुभि', 'कीर्तिमुख', 'पादमध्याधरा', 'विधाधरसमन्वित तोरण', वगैरे प्रयोग मिळतात. या अशा प्रकारच्या पदांचा अर्थ मध्यकालीन प्रतिमांचा अभ्यास केल्यास प्रत्यक्ष समोर उभा राहतो.
कित्येकदा मूर्तिशास्त्र जुन्या ग्रंथाचा किंवा त्यातील अंशाचा कालनिर्णय करण्यास मदत करिते, ती प्रक्रिया अशी. शास्त्रीय उत्खनने, मूर्तीवरील अभिलेख, तुलनात्मक अभ्यास, वगैरे साधनांच्या मदतीने प्रतिमांचा निर्माण काल बऱ्याच अशी निश्चितपणे ठरविता येतो. अशा मूर्तीना त्यांच्या ग्रंथिकवर्णनाशी ताडून पाहिल्यास ग्रंथाच्या किंवा त्याच्या अंशाचा कालाची बरीचशी कल्पना करता येते. एक उदाहरण घेऊ. गुप्तकाळापर्यंत विष्णूच्या हातात कमळ दिसत नाही, त्याचा उजवा हात अभयमुद्रेत असतो. अर्थात् विष्णूच्या हातातील कमळाचा उल्लेख करणारे ग्रंथिक अंश गुप्तकाळाच्या नंतरचे असावेत असा कयास बांधता येतो. त्याच प्रमाणें कृष्णांच्या नाकातील मोती किंवा 'बुलाक' (नासाग्रे वरमौक्तिकम्) विष्णूच्या पायातील नूपुरें, वगैरे दागिने मध्यकाळाच्या पूर्वी कोणत्याही प्रतिमेत दिसत नाहीत. अर्थात् त्यांचा उल्लेख करणारे पद्मपुराणादि ग्रंथांचे अंश फार जुने असू शकत नाहीत.
निरनिराळ्या दृष्टीने केलेल्या वरील विवेचनाने मूर्तिविज्ञान हा विषय किती उपयोगी आहे हे सहज स्पष्ट होईल.
मूर्तिपूजेची प्राचीनता :
आपणांस माहीत असलेल्या प्राचीन भारतीय सभ्यतेचा पहिला महत्त्वाचा दुवा सिंधुनदीच्या खोऱ्यातील संस्कृती हा होय. त्याप्रमाणे प्राचीनतम वाङ्मय म्हणून वैदिक वाङ्मयाकडे बोट दाखवितात. ही साधने मूर्तिपूजेविषयी काय माहिती देतात ते प्रथम पाहू.सिंधु नदीच्या खोऱ्यांत जी पुरातात्विक उत्खनने झाली, त्यांत बऱ्याचशा वस्तू आपल्या हाती आलेल्या आहेत. त्यापैकी मूर्तिशास्त्रांवर प्रकाश टाकणाऱ्या खालील वस्तू उल्लेखनीय आहेत.
१) मोठ्या संख्येत मिळालेले लिंगाकार दगड ज्यांचा संबंध लिंगपूजेशी लावतात. त्याबरोबरच मधोमध भोक असलेले गोल दगडही मिळाले आहेत ही योनिपीठे असावीत अशी कल्पना आहे.
२) एका चौकोनी तुकड्यावर तीन डोकी असलेला व शिंगाचा मुगुट घातलेला एक पुरुष योगासनांत बसलेला दाखविला आहे. श्री बानर्जी यांच्या मते हे कर्मासन आहे. या पुरुषाच्या आजूबाजूस म्हैस, गेंडा, हत्ती, वाघ व एक मानव प्राणी दिसतो. मार्शल यांच्या मते हा पुरुष म्हणजे पशुपति शिवाचे प्रारंभिक रूप होय.
३) एका दुसऱ्या तुकड्यावर आसन घालून बसलेल्या पुरुषाच्या डोक्यावर फणां पसरलेला साप दिसतो व आजूबाजूस गुढघे टेकून बसलेले उपासक ही दिसतात.
४) इतर तीन तुकड्यांवर जैन तीर्थकरांप्रमाणे कायोत्सर्गमुद्रेत उभे विवस्त्र असे वृक्ष देव दाखविते आहेत. या प्रत्येकाच्या जवळ अर्धा वाकलेला व डोक्यावर साप असलेला असा उपासक आहे.
५) मातीचे इतर कित्येक तुकडे असे आहेत ज्यावर मानव आकृत्या काढलेल्या आहेत. मॅकेची कल्पना अशी की या गृहदेवता असाव्यात.
६ ) विशिष्ट प्रकारची केशभूषा केलेल्या मातीच्या स्त्रीप्रतिमाही आपणांस मिळाल्या आहेत. यांना 'मातृदेवी'च्या असे जरी असले तरी या संस्कृतीच्या चित्रलिपीचे जोपर्यंत आपणास आकलन होत नाही तोपर्यंत या संस्कृतीचा निश्चित असा काल ठरविणे विवादास्पदच आहे.
मूर्तिपूजेच्या इतिहासाचा दुसरा टप्पा म्हणजे सुरुवातीच्या काळातील तांब्याच्या त्या काहीशा मानवाकार वस्तू होत ज्या कॉपर होर्डस् मधे मोडतात. अशा वस्तूचे नमूने लखनौ, हरिद्वार, पाटणा, व कलकत्ता येथील संग्रहालयात ठेवलेले आहेत. काही विद्वानांच्या मते ही विशिष्ट संप्रदायाची उपासना चिन्हे असण्याची शक्यता आहे. "

आता वाड्मयाकडे वळू. प्रथम 'मूर्ती' शब्दाकडे पहा, या शब्दानेच विशिष्ट व्यक्ती किंवा देवतेचे मूर्त स्वरूप, व त्या बरोबरच अनुकृती व सादृश्य या गोष्टी ध्वनित होतात. प्रतिकृती, प्रतिमा, बिंब, वगैरे शब्द ठोकळमानाने समानार्थक होत. वाल्मीकीय रामायणांत असलेला अश्वमेधयज्ञाच्या वेळीच सीतेच्या सुवर्णप्रतिमेचा उल्लेख, महाभारतातील धृतराष्ट्राने कवटाळलेली भीमाची लोखंडी प्रतिमा, शुक्रनीतीतील मानवबिंबाचे वर्णन वगैरे स्थळें प्रतिमेत निहित असलेल्या सादृश्याच्या कल्पनेकडे संकेत करतात. जीवित किंवा मृत व्यक्तींच्या प्रतिमा घडविणे व त्यांना स्थापित करणे या गोष्टींचे अस्तित्व इतर प्रमाणानेही सिद्ध करता येईल. पण तेवढ्याने असे मात्र म्हणता येणार नाही कि अशा प्रकारच्या प्रतिमा सर्वत्र पूजनीय समजल्या जात असत. त्यामुळे वरील अर्थाने वापरलेले प्रतिमा, प्रतिकृती, बिंब, मूर्ती, वगैरे शब्द फक्त स्मृतिचिन्हाच्या अर्थानच घ्यावे लागतील व त्याचा आपल्या विषयाशी जवळचा संबंध आहे असे गृहीत धरता येणार नाही.
मूर्ती शब्दाचे आज चालू असलेले इतर पर्याय अर्चा, बेर आदि होत, पण खरे म्हणजे त्यांच्या शक्तींत भेद आहेत. विशेषतः अर्चा शब्दांत नित्योपासनेचा व पूजनाचा भाव लपलेला आहे. त्यामुळे प्राचीन वाङ्मयाचा आढावा घेताना पूजेकरिता उपयोगात येणाऱ्या प्रतिमांच्या उल्लेखांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
वेद काळातील मूर्तिपूजा :
वैदिक युगातील मूर्तिपूजेच्या अस्तित्वाविषयी विद्वानांत मतभिन्नता आहे." मॅक्सम्युलर, एच्. एच्. विल्सर मॅकडोनेल, वगैरे परदेशी व डॉ. काणे, जितेंद्रनाथ बॅनर्जी, वगैरे भारतीय विद्वानांतच्या मते ऋग्वेदांत मूर्तिपूजेचे उल्लेख नाहीत. बोलेनसन, वेंकटेश्वर वगैरे लोकांची मते या विरुद्ध आहेत.१) इंद्राला विकण्याचा व विकत घेण्याचा उल्लेख यथा "दहा गावें देऊन कोण माझ्या इंद्राला विकत घेईल व वृत्राचा वध झाल्यावर पुनः त्याला परत करील?" दुसऱ्या उल्लेखांत इंद्राला दहा हजार किंवा शंभर हजारालाही न विकण्याची चर्चा आहे. हे उल्लेख इंद्रप्रतिमेला विकण्या किंवा विकत घेण्यासंबंधी असावेत असा तर्क आहे.
२) रुद्राच्या रंगीत मूर्तीचे वर्णन."
३) सोनेरी कोट घातलेल्या वरुणांचे वर्णन."
४) इंद्र व अग्नीला अलंकृत करण्याची चर्चा"
५) इंद्राला 'सुशिप्र' (सुंदर गाल किंवा जबडे असणारा), रुद्राला 'कपर्दिन' (जटाजूट असणारा) व वायूला 'दर्शत्' किंवा सुंदर असे म्हणणे."
६) देवाला सात हात, चार शिंगें, तीन पाय, , वगैरे असल्याची वर्णने, वेंकटेश्वरांच्या मते हे अग्नीचे वर्णन होय. मध्यकाळ व त्यानंतर अशा प्रकारच्या ज्या प्रतिमा मिळतात, त्यांना अग्नी म्हणूनच ओळखले गेले आहे.
७) इंद्राला तुविग्रीव, वपोदर, सुबाहू, हरिकेश, हरिश्मश्रु, वगैरे संबोधनें.
८) वाजसनेयी संहितेत रुद्राला निळा गळा व लाल तोंडाचा आणि कृत्ति किंवा चामडे धारण करणारा असे म्हटले आहे.
९) तैत्तिरीय ब्राह्मणांत भारती, इडा आणि सरस्वती यांच्या सुवर्ण प्रतिमांचा उल्लेख आहे.
वरील विधांनांच्या आधारावर स्वीकारण्यांत येणारे मूर्तिपूजेचे वेदकालीन अस्तित्व अर्थातच सर्वमान्य नाही, दुसरा असाही विचार मांडण्यात येतो की वैदिक संहितेतून ज्या संस्कृतीचे चित्र आढळते ती बव्हंशी उच्चवर्गीय आर्याची संस्कृति आहे, बहुजन समाजाची मूर्तिपूजेचे प्रचलन नव्हते, पण आर्येतर लोकांचा म्हणजे भारताच्या मूलनिवासियांचा जो वर्ग होता. त्यांच्या चालीरीति काही निराळ्या असाव्यात. या आर्येतर वर्गाला ऋग्वेदांत शिश्नदेव, राक्षस, अनुतदेव, मूरदेव, वगैरे नांवाने संबोधिले आहे. 'शिश्न एव देवाः येषां ते शिश्नदेवाः' अशी व्युत्पत्ती लावून काही विद्वान त्यांना लिंगपूजक ठरवितात." मात्र सायण असा अर्थ करीत नाही, तो त्यांना अब्रह्मचारी मानतो इतकेच. ऋग्वेदांत एका दुसऱ्या स्थानी शिश्न शब्दाचा प्रयोग केलेला आहे, येथेही सायणाने राक्षसाशी संबंध लावला आहे. इतरत्र मूरदेवांचा नाश करण्याची इंद्राला प्रार्थना केलेली आहे. मूरदेवांचा अर्थ मलदेव आणि राक्षस असा केला आहे. विल्सन यानें हे पद 'फालतू देवांवर विश्वास ठेवणारे' आणि अविनाशचंद्र दास यांनी 'दगड, झाडाचे बुंधे यासारख्या अचेतन वस्तूंचे पूजन करणारे' असा केला आहे. दासांचा संकेत एक प्रकारे प्रतीकपूजन किंवा मूर्तिपूजेकडे दिसतो.
येथपर्यंत केलेल्या मीमांसेचा संक्षेप असा की वेदकाळाच्या सुरवातीला उच्चवर्गीय आर्यात मूर्तिपूजा नसावी पण तिच्यावर विश्वास ठेवणारा एक वर्ग अस्तित्वात होता. ही स्थिति बऱ्याच काळपर्यंत टिकलेली दिसत नाही. वेदवाङ्मयाच्या उत्तर भागांत अर्थात् ब्राह्मण आणि आरण्यकांचे खिल अंश आणि गृह्यसूत्रांत देवप्रतिमा, मंदिरे, वगैरेचे स्पष्ट उल्लेख दिसू लागतात, 'पंचविंश' किंवा 'ताण्ड्य ब्राह्मणांच्या शेवटल्या भागांत ('अद्भुत ब्राह्मणांत') दिव्य आणि शकुनापशकुनांचे एक प्रकरण आहे. तेथे देवप्रतिमांचे नाचणे, रडणे, हसणे, धुंकणे आदि क्रिया अपशकुन म्हणून मानल्या गेल्या आहेत. गृह्यसूत्रांत याहीपेक्षा सुस्पष्ट उल्लेख आहेत. पारस्कर गृह्यसूत्रांत असे विधान आहे की रथात बसून स्नातक देवप्रतिमेकडे जात असला तर तेथे पोचण्याच्या अगोदरच त्याने रथाचा त्याग करावा आपस्तम्बगृह्यसूत्रांत ईशान, मीढुषी आणि जयंत या देवतांच्या मूर्तीचे उल्लेख आहेत. यावरून सूत्रकाळांत मूर्तिपूजेची स्थापना झालेली होती हे स्पष्ट दिसते.

मूर्तिपूजेचा उद्भवः
या विषयी साधारणपणे तीन मतं प्रतिपादित आहेत. ती अशी :१) मूर्तिपूजा द्रविड आणि शुद्र जातीतून उद्भवली व पुढें ती ब्राह्मण समाजांत चांगलीच मिसळली. या मतांचे पुरस्कर्ते डॉ. फरक्युहर व डॉ. कारपेंटीयर हे होत.
२) ब्राह्मण धर्मीयांची मूर्तिपूजा बौद्धांच्या अनुकरणांमुळे आली.
३) मूर्तिपूजनांची पद्धत ही स्वाभाविक आणि स्वयं उद्भूत उपासना शैली होय.
आज प्रथम दोन्ही मतांची मान्यता संपुष्टांत आलेली आहे. डॉ. काण्यांच्या मते औपनिषदीय विचारधारेची स्थापना आणि अहिंसेच्या सिद्धांताची प्रतिष्ठा यामुळे वैदिक यज्ञ पद्धतीची पकड ढिली पडली आणि प्रतिमापूजनांचा उदय झाला. सुरवातीला याची पद्धत आणि विस्तार साधारण होता पण मध्यकाळापर्यंत तो फारच गुंतागुंतीचा होऊ लागला.
भक्तीचे मूळ वैदिक वाङ्मयात सापडते. ऋग्वेदांत एकेश्वरवादाचा विषय, सज्जनांची काळजी करणाऱ्या व सर्वांच्याच कामांवर नजर ठेवणाऱ्या वरुणाची अपराधांसाठी क्षमा प्रार्थना, यज्ञाची अनुष्ठानें करून काळ, ऐश्वर्य वगैरे मिळविण्याचे उल्लेख, अपरोक्षरूपाने भक्तिवादाचेच पोषण करतात. उपनिषदांनी जरी पुढे निर्गुणोपासनेचा पुरस्कार केला असला तरी त्याने भक्तिवादाचे बी नष्ट झाले नाही, ईशाची महिमा, समजून घेण्याकरिता धात्याचा 'प्रसाद' आवश्यक आहे असे विधान उपनिषदांत केले आहे.
भक्ती शब्दाचा प्रयोग प्रथम श्वेताश्वेततरोपनिषदाच्या शेवटल्या भागांत आढळतो." पुढच्या वाड्मयात तर त्याचा चांगलाच वापर झाला आहे. भक्तिचा इंद्रादि वैदिक देवतांशी फारसा संबंध आलेला दिसत नाही, तेथे विष्णू, शिव, सूर्य, शक्ती, वगैरेचे प्रामुख्य दिसत असून सर्वांचा एकेश्वरवादांत समावेश झालेला आढळतो. काही विद्वानांचे असे मत आहे की भक्तिच्या क्षेत्रात अग्रेसर झालेल्या निरनिराळ्या संप्रदायाची इष्टे मुळांत विशिष्ट प्रतिभावान माणसेच होतो. पुढे त्यांची ईश्वराशी स्वरुपता व समानता स्वीकारण्यात आली. उदाहरणार्थ छान्दोग्य उपनिषदाचा देवकीपुत्र कृष्ण पांचरात्रादि वैष्णवांचा वासुदेव झाला. शाक्यमुनी गौतम, निर्ग्रथ महावीर, पुराणांतील मणिभद्र, पूर्णभद्र. वगैरे यक्ष मुळात माणसेच होती, पण पुढे त्यांना ईशत्व प्राप्त झाले.
सारांश भक्तिवादाच्या स्थापनेबरोबरच प्रतिमा आणि प्रतिमा पूजनाचाही उदय झाला व निरनिराळ्या संप्रदायाचा देवतासंघ जसा जसा वाढू लागला, प्रतिमांची ध्यानें व धारणा ही वाढत गेल्या.

महाविलयन पद्धत आणि देवतासंघाचा विकास : -
भारतीय विचारधारेचे एक प्रमुख वैशिष्ट्य असे आहे की येथे नवीन सिद्धांताची स्थापना जुन्याचा समूळ उच्च्छेद केल्यावर होत नसून त्याला आत्मसात् करीत होत असते. हा नियम देवतासंघालाही लागू पडतो. जसा जसा काळ लोटत गेला व अनेक नवीन संप्रदायांचा उदय होत गेला, तसाच भारताचा देवतासंघ हा वाढीस लागला. ही प्रक्रिया खालील प्रकारे झालेली आढळते :१) प्राचीनांचा नवीनांत विलय.
२) बाह्य विचारधारांशी आपला संबंध येणे व त्यांच्या प्रभावांमुळे नवीन देवतांचे आगमन.
या विषयी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की भारतांत प्राचीनांचा विलय व नवीन मतांची स्थापना तलवारीच्या धारेवर झालेली नाही. निरनिराळ्या परंपरांचे परस्पर संपर्क, शास्त्रार्थ, विचारस्वातंत्र्य, रुढी आणि मानसशास्त्राप्रमाणे पडणारे प्रभाव हे त्याचे आधार होत. ह्या दीर्घकालीन प्रक्रियेचा एक परिणाम असा झाला कीं परस्परांविरुद्ध अशा संप्रदायांची कटुता काळाच्या प्रभावानें चांगलीच कमी झाली व दोघे ही शेजारधर्माचे अनुसरण करीत नांदताना दिसू लागले. यज्ञाच्या अनुष्ठानांना व वेद प्रामाण्याला आवाहन करणारे गौतम बुद्ध व आदिनाथ ऋषभ हे विष्णूच्या अवतार मालिकेत मोजले जाऊ लागले, निर्ऋति व कुबेरासारखे राक्षस सर्वांस मान्य असे लोकपाल झाले.
प्राचीन आणि नवीन किंवा जुनें आणि नवे यांची कालांतरांत झालेली सरमिसळ हिला आपण 'महाविलयनाची प्रक्रिया' अथवा फक्त नमूने पौराणिक वाङ्मयांत भरपूर आढळतात. दृष्टांत म्हणून काही उदाहरणे देतो.
लिंगपुराणांत" कथा आहे की एकदा प्रजापतीने रुद्राला सृष्टी उत्पन्न करण्यांविषयी आज्ञा दिली. रुद्राने आपली पत्नी सती हिच्या मदतीने स्वतः सारख्याच लोकांचे उत्पादन सुरू केले, पण ही 'रौद्रीसृष्टी' प्रजापतीला आवडली नाही, व त्याने रुद्राला सृष्टी बंद करण्यास सांगितले. रुद्रानें काही अटींवर प्रजापतीचे म्हणणे ऐकले, त्या अटी अशा की रुद्राकडून उत्पन्न झालेले लोक पुढे 'रुद्र' म्हणूनच ओळखले जावेत, त्यास नेहमीच देवतांच्या समकक्ष असे स्थान मिळावे आणि यज्ञांत समान भाग प्राप्त करण्यांचा अधिकार ही असावा. प्रजापतीनें ते स्वीकार केले. कथेवरून हे स्पष्ट होते की प्रजापतीला पसंत नसून देखील नव्या रौद्री सृष्टीचें तिचा पुढील प्रसार थांबविण्यांकरिता काहीं अटी स्वीकारून देव समाजात विलयन करून घ्यावे लागले.
याचप्रमाणें कांही दितिपुत्रांचें देववर्गात विलयन कसे झाले हे सांगणारी कथा मत्स्यपुराणांत येते. कश्यप ऋषींची बायको दिती हिच्या पुत्रांना 'दैत्य' अशी संज्ञा आहे. दैत्यांचा इंद्राने पराभव केला. त्याचा वचपा काढण्यासाठी दितीने इंद्राचा नाश करणारा पुत्र मिळविण्यांसाठी तप केले. त्यामुळे कश्यप प्रसन्न झाले व दितीला दिवस गेले. इंद्र स्वतःचे संरक्षण करण्यांस टपला होताच. दितीच्या तपः पूत जीवनचर्येत त्याला एक दोष आढळताच त्याने तिच्या गर्भात प्रवेश केला व त्याचे ४९ तुकडे केले. तरी पण गर्भाचा नाश होऊ शकला नाही व शेवटीं दितीच्या या ४९ पुत्रांना मरुद्गण असें नांव देऊन देवसंघात स्थान देणें इंद्राला भाग पडले. ही कथा फार प्राचीन घटनेचे वर्णन करीत असावी कारण मरुद्गणांना- दितीच्या पुत्रांना, दैत्यांना-वेद काळांतच मानांचे स्थान प्राप्त झाले होते.
महाभारतांप्रमाणे मुळांत राक्षस जातीचा असलेला कुबेर पुढे देवांचा धनाधिपतीच नव्हें तर उत्तर दिशेचा मालक, आणि शंकराचा परम मित्र झाला. याचप्रमाणें दुसरा राक्षस निर्ऋति हा नैऋत्य दिशेचा स्वामी म्हणून स्वीकारला गेला. असेच विलयन प्रक्रियेंमुळे यक्षाला देव समाजांत स्थान मिळालें.
महाविलयनांचा हा क्रम पौराणिक काळांतच नव्हे तर ऐतिहासिक युगांत देखील चालू राहिला. मौर्य वंशाचा राजा अशोक आपल्या एका शिला लेखांत" असें विधान करतो की त्याने जंबुद्वीपाच्या 'अमिश्र' देवांना 'मिश्रीभूत' केले अर्थात् इतस्ततः विखुरलेल्या लोकदेवतांचा शिष्टमान्य देवतासंघात समावेश करून घेतला. गुप्तकाळातील कोषकार अमरसिंह याच्या ग्रंथांवरून स्पष्ट कळते की सहाव्या शतकांपर्यंत या लोक देवतांची देवसंघात प्रतिष्ठा पूर्णपणे स्वीकारली गेली होती. त्याने विद्याधर, यक्ष, पिशाच, गुह्यक, वगैरेस देवयोनीतच मोजले आहे.
थोडक्यांत बोलावयाचे म्हणजे 'महाविलयन प्रक्रियेला' पुष्ट करणाऱ्या खालील गोष्टी होत्या.
१) वैदिक आणि पौराणिक देवतांचे एकीकरण आणि हळुहळू पौराणिक देवतांना प्राधान्य प्राप्त होणें.
२) जगातील निरनिराळ्या ठिकाणीं विकसित होणाऱ्या प्राचीन संस्कृतीत 'मातृपूजा' किंवा 'शक्तिपूजेचे' मान्य असे अस्तित्व.
३) वृक्ष, नाग, शिवलिंग, वगैरे मुळांत अवैदिक असलेल्या उपासनाप्रतीकांस शिष्ट समाजांकडून पूर्ण मान्यता मिळणे.
४) जन्म, मृत्यु, रोगराई, वगैरेशी संबंधित पाचवी, सटवी, मरी आई, शीतला या सारख्या लोकदेवतांना शिष्ट समाजात स्थान मिळणें. मातृका, जिवत्या, यक्ष, वगैरे अनेक देव याच वर्गात मोडतात.
५) पुढील काळात मुंजा, म्हसोबा, मेसको, मायेराणी, वेताळ, ब्रह्मगिऱ्हा. ब्रह्म, वीर, ब्रह्म-राक्षस, झोटिंग, वगैरे ही यांत समाविष्ट झाले व आजही त्यास मान्यता आहे.
६) परदेशी शासकांच्या काळांत मुख्यत्वें करून कुषाणाचे वेळीं ग्रीक आणि इराणी देवतांनी भारतांत प्रवेश केला व काळाच्या प्रभावानें त्यांची नांवे व रूपे ही बदलली गेली व पूर्ण मान्य झाली. फॅरो हा पश्चिक कुबेर झाला, ऑरडोक्शो लक्ष्मी झाली, नना किंवा ननैया हिला सिंहवाहिनी दुर्गेचे रूप मिळाले, तर मग लोकांनी इराणी सूर्याला महत्त्वाचें स्थान मिळवून दिले.
महाविलयनांची ही प्रक्रिया आतां अवरूद्ध झालेली आहे असे नाही, तिचे आज ही कार्य चालू आहे व नेहमीच चालू राहील. कारण भारतीय स्वभावाचा तो अभिन्न असा एक गुणधर्म आहे.

मूर्तिपूजेचे जुनें उल्लेख : वेदोत्तर काळ :
मूर्तिपूजेच्या प्राचीनतेचा विचार करीत असतांना मागे आपण उत्तर वेदकाळांपर्यंत विचार केलेला आहे. त्यानंतर प्रतिमापूजनांचे बरेच उल्लेख मिळू लागतात. त्या आता धावता आढावा घेऊ.बौद्ध साहित्यांत बराच जुना आणि महत्त्वाचा उल्लेख 'निद्देस' टीकेंत मिळतो." येथे बऱ्याचशा धार्मिक मतांची मोजणी करीत असतांना निग्रंथ आणि आजीवकांच्या बरोबरच वासुदेव, बलदेव, अग्नी, पूर्णभद्र, चंद्र, इंद्र, ब्रह्मा, सूर्य, वगैरेच्या उपासकांची नांवें नोंदली आहेत, यांच्या प्रतिमांचा जरी स्पष्ट उल्लेख नसला तरी त्यांचे अस्तित्व स्वीकारणें तर्कसीमेच्या बाहेरचे नाही.
पाणिनीचा पुरावा :
या नंतर महत्त्वाचा पुरावा पाणिनीच्या ग्रंथात मिळतो. पाणिनीचा काल बिंबिसार आणि कौटिल्य यांच्या मधला अर्थात् सुमारे इ.पू. पांचव्या शतकाचा मध्यभाग समजतात." पाणिनीय पुराव्याचे स्वरूप खालीलप्रमाणें सांगता येईल."क) वेदकाळांतील इंद्रवरुणादि देवांच्या बरोबरच द्यावा-पृथ्वी, सोम-रुद्र असे जोड देव प्रचारांत होते. सूत्रकाळांपासून ब्रह्म-प्रजापति, शिव-वैश्रवण, संकर्षण-वासुदेव, स्कंद-विशाख अशी काही नवी युग्में तयार झाली. याशिवाय मास, अर्धमास, संवत्सर, ऋतु, नक्षत्रे यांनाही देव-पद प्राप्त झाले.
ख) भक्तिमार्गाच्या उदयामुळे लोकधर्माशी संबंधित अनेक देवतांची प्रतिष्ठा वाढीस लागली.
ग) देवाच्या प्रीत्यर्थ देव प्रतिमेला गंध, फूल, नैवेद्य वगैरे समर्पण करण्यांची पद्धत रुढ होऊन ते भक्तिधर्माचे आवश्यक असें अनुष्ठान झाले.
घ) बुद्ध, महावीर, कृष्ण, अर्जुन, नर, नारायण वगैरे विशिष्ट पुरुषांना देवांचे स्थान मिळाले व त्यांचे संप्रदाय वाढू लागले.
ङ) पाणिनीनें देवमूर्तीकरिता 'प्रतिकृती' व 'अर्चा' असें शब्द वापरलेले आहेत. एका सूत्रांत त्यानें असे दर्शविले आहे कीं काहीं देव प्रतिमा जीविकेकरिता घडवीत पण त्या विकत नसत, या उलट काही प्रतिमा विकल्या जात पण बहुतेक त्या पूजेकडें वापरीत नसत.

मौर्यकालीन उल्लेख :
आतां मौर्यकालांकडे वळू. कौटिल्याच्या अर्थशास्त्रांत या संबंधी बरीच माहिती आहे. पण तिचा साकल्यानें कोठे विचार झांला असल्याचे आमच्या ऐकिवांत नाही, म्हणूनच तिचा थोडा जास्त आढावा घेत आहोत." मूर्तिशास्त्रांसंबंधी ही माहिती गोळा करताना कौटिल्याची सूत्रे व त्यावरील इतर ग्रंथकारांच्या टीका हाताळव्या लागतात. एकूण सगळ्या माहितीचे चार वर्ग पडू शकतात :१) देवगृह २) देवप्रतिमा ३) उपास्यदेवता आणि ४) विशिष्ट देवता
कांही देवगृहें नगरांत बांधीत व काही बाहेर असत. कधी कधी ती जमिनीच्या खाली देखील असत. देवगृहाचे जागेवर शेत करता येत नसे व घाण केल्यास दंड मिळत असे. या देवगृहांच्या बांधणी किंवा आकाराबद्दल कौटिल्य काहीच सांगत नाही.
साधारणपणे देवप्रतिमा भरीव असतात, पण कौटिल्यानें बऱ्याच ठिकाणी पोकळ मूर्तीचे वर्णन केलेल आहे. प्रतिमांची चोरी करणाऱ्यासाठी मृत्यूवधाचा दंड सांगितला आहे. मूर्तीची मिरवणूकही काढीत असत. उपास्य देवतांची गटवारी असावी असें दिसते. अपराजिता (दुर्गा), अप्रतिहत (विष्णू), जयंत (सुब्रह्मण्य), वैजयंत (इंद्र) या नगर देवता होत. राजदेवतांच्या गटांत शिव, वैश्रवण, अश्वी व मदिरा यांची गणना होती. त्यांत वैश्रवण हा कुबेर असून मदिरा ही शेतीची देवी होती. हिलाच सीता या नांवाने ओळखत असत. सीतेव्यतिरिक्त प्रजापती, काश्यप आणि देव म्हणजे ढग ही देखील कृषिदैवतें होती. या शिवाय कौटिल्यानें द्वारदेवता, दिग्देवता, देशदेवता, दुर्गदेवता, राष्ट्रदेवता आणि आपत्तीतून सोडविणाऱ्या व शत्रूसाठी संकट उत्पन्न करणाऱ्या देवतांचे स्पष्ट उल्लेख केले आहेत. कोषगृहाचा देव कुबेर तर पण्यकोष्ठागाराची श्री, कुप्यगृहाचा विश्वकर्मा, आणि आयुध-बंधनागाराचा वरुण हे देव मानले जात असत. अर्थशास्त्रानें उद्धृत केलेल्या विशिष्ट देवता म्हणजे संकर्षण किंवा बलराम, नाग, वरुण आणि श्मशानदेवता या होत.
कौटिल्यानें एका ठिकाणी असे विधान केले आहे की देवताध्यक्ष नांवाच्या अधिकाऱ्यानें देवमूर्तीच्या मदतीनें त्या विकून सुवर्ण संचय करावा व कोषांची वाढ करावी. या मौर्यकालीन पद्धतीचा उल्लेख पतंजलीही आपल्या टीकेंत करतो. ""
देवप्रतिमा युद्ध स्थळांवर ही नेत असत असें ग्रीक उल्लेखांवरून दिसतें. क्कीण्टस कर्टियसचें म्हणणें असें कीं अलेक्झेंडर बरोबर युद्ध करण्याचे वेळीं भारतीय राजा पोरस किंवा पुरु याच्या सैन्यांपुढें 'हरक्युलियस' ची मूर्ती मिरवली जात असें. ग्रीकांनी 'हरक्युलियस' म्हणून ओळखलेला हा देव शिव, कृष्ण किंवा एखादा यक्ष असावा असें भारतीय विद्वानांचे म्हणणें आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रांप्रमाणेच मनुस्मृतीत ही देवप्रतिमांचा सन्मान सूचित करणारी कित्येक विधानें आढळतात."

शुंग व कुषाण काळांतील अभिलेखीय व वाङ्मयीन पुरावे -
मौर्यकाळांतील आज माहित असलेल्या देवप्रतिमा म्हणजे क्वचित सोन्याच्या व बव्हंशी मातीच्या मातृदेवीच्या प्रतिमा होत. अशा मूर्ती मथुरेकडे बऱ्याच सांपडल्या आहेत. शुंगाळांपासून प्रत्यक्ष मिळणाऱ्या देवप्रतिमांची संख्या वाढते. दगड व माती या दोन्ही माध्यमात तयार केलेल्या लक्ष्मी, बलराम, कामदेव, वसुधारा, यक्ष, नाग, लोकपाल वगैरेच्या प्रतिमा, शिवलिंगे, जैन व बौद्ध प्रतीकें आपणांस शुंग काळांपासूनच मिळतात.या निरनिराळ्या देवप्रतिमा व त्यांच्याशी संबंधित असलेल्या संप्रदायाचा पाठपुरावा अभिलेख व वाङ्मयांकडून होतो. अभिलेखांत घोसुण्डी, अंबलेश्वर (राजस्थान); भरहूत, साँची, विदिशा (मध्यप्रदेश); मथुरा (उ.प्र.); नाणेघाट (महाराष्ट्र), वगैरे स्थानांवर मिळालेल्या अभिलेखांची प्रामुख्याने गणना करावी लागेल.
वाङ्मयांकडे दृष्टी टाकल्यास वाल्मीकीय रामायण, महाभारत, जुन्या स्मृती; तसेच वायु, ब्रह्म, मत्स्य, विष्णु वगैरे बव्हंशी प्राचीन मानल्या जाणाऱ्या पुराणग्रंथात मूर्तिपूजेचे संक्षिप्त किंवा विस्तृत उल्लेख आढळतात. काही फारच ठळक उदाहरणे नमूद करतो.
ग्रंथ मूर्तिशास्त्राशी संबद्ध मुख्य विषय
लौगाक्षीस्मृति - शिव, शैव देवता
वृद्धहारितस्मृति - विष्णू, वैष्णव, अवतार, ध्यानें, पूजन प्रकार, प्रतिमा निर्माणाची साधनें वगैरे.
भारद्वाजस्मृति - विष्णू, गायत्री,
वसिष्ठस्मृति - विष्णुप्रतिमा, प्रतिमा निर्माणांची साधनें
मार्कण्डेयस्मृति - देव-प्रतिमांची दानें
वाल्मीकीय रामायण - स्कन्दोपासना, विष्णुची मंदिरे, आयुधपुरुष यक्षिणी, इंद्रध्वज, लोकपाल, इत्यादि
महाभारत - शिवमूर्ती संबंधी शिवाची नांवे, हरिहरांचे ऐक्य, लिंगपूजन विष्णू व देवीची उपासना इत्यादि.
वायुपुराण - अर्धनारीश्वर स्वरूप, लिंगोद्भव मूर्तिकथा, शिव व त्याचे सिंह, वगैरे विषय.
मत्स्यपुराण - अष्टमंगल प्रतीकें, शिवमूर्ती, स्कंद, देव प्रतिमाचे निर्माण, प्रतिष्ठा, त्यांचे आकार लक्षणें, इत्यादि विषय
विषयाच्या दृष्टीनें वरील उदाहरणें फारच जुजबी आहेत पण जुन्या वाङ्मयांत अप्रत्यक्षपणें किंवा प्रत्यक्षपणे देखील मूर्तिविज्ञानासंबंधीं माहिती कशी गोवलेली आहे याचा संकेत देण्यांत ती पुरी आहेत.
कुषाणकाळांत मूर्तिविज्ञानाचा चांगलाच विस्तार होऊ लागला, किंबहुना असे म्हणणे योग्य ठरेल कीं ब्राह्मण, बौद्ध व जैन तिन्हीं धर्मांच्या मूर्तिशास्त्राचा पाया येथूनच पुढें स्पष्टपणे वर येतांना दिसतो. मूर्ती घडविण्यांसंबंधी निरनिराळे प्रयोग येथून सुरू झाले, ध्यानांचे स्वरूप ठरू लागले, आराखडे बांधले जाऊ लागले व वाङ्मय आणि कला दोन्हीं क्षेत्रांत मूर्तिशास्त्र वाढीस लागले. बौद्धांनी बुद्ध आणि बोधिसत्त्व यांना प्रत्यक्ष नांवारूपाला आणले, जैनाचार्यांनी तीर्थकरांच्या प्रतिमा घडविल्या, तसेच सनातनी लोकांकडे विष्णू, त्याचे काही अवतार, शिव व शिवलिंगे, महिषमर्दिनीदुर्गा, लक्ष्मी, षष्ठी, मातृदेवता, एकानंशा वगैरे देवतांचे निर्माण होऊ लागले, आणि तशाच नाग, यक्ष, किन्नर, वगैरे उपदेवतांच्या ही लहान मोठ्या प्रतिमा लोकाभिरूचि प्रमाणें घडविल्या जाऊ लागल्या.
प्रतिमाशास्त्राच्या येणें प्रकारे होणाऱ्या बहुमुखी प्रगतीचे पडसाद जैन, बौद्ध व ब्राह्मणधर्मीय वाङ्मयांत व निरनिराळ्या अभिलेखांत सहजच उमटलेले दिसतात. फक्त साहित्यिक किंवा धार्मिक ग्रंथांतच नव्हे तर अंगविज्जा, चरक संहिता वगैरे इतर शास्त्रांच्या ग्रंथात देखील मूर्तिशास्त्रांविषयी घरीच सामग्री आढळते. तिचा निव्वळ नामोल्लेख करण्यांस देखील बरीच पानें खचर्ची घालावी लागतील. तेव्हा तिकडे न वळता एवढेच सांगून हा विषय संपवितो कीं कुषाणकाळापर्यंत मूर्तिशास्त्राच्या विकासाने बराच मोठा पल्ला गाठला होता.
प्रतिमा निर्माण व प्रतिष्ठा : -
सगुणोपासनेची दोन रूपे म्हणजे एक ध्यान धारणा करून मनानेच केलेली उपासना व दुसरे म्हणजे बाह्य उपकरणांच्या मदतीने होत असलेली उपासना ही होत. इष्टाची मानसिक प्रकारे आराधना करणें जिला 'मानसपूजा' असे म्हणतात ती सगुण उपासनेची वरची पायरी आहे. ती सर्वांना सहज साध्य होत नाही म्हणून बाह्य प्रकाराचा अवलंब केला जातो. येथें समर्पण करण्यांचे उपचार आणि ज्या माध्यमाने ते इष्टापर्यंत पोचते करावयाचे ते माध्यम अशी दोन प्रमुख अंगे आहेत. यांत फक्त माध्यमांचाच विचार आपल्या कक्षेत येतो.उपासनेच्या या माध्यमांना तीन वर्गात विभाजित करता येईल. ते असे -
१) पाणी, सूर्यमंडल, अग्नी, दिवा, स्थंडिल किंवा वेदी वगैरेच्या ठिकाणी इष्टाच्या अस्तित्वाची कल्पना करून किंवा त्याचे आवाहन करून बाह्योपचार समर्पण करणें.
२) ग्रंथ, उपभुक्त वस्तू, यंत्रे, मंडलें, विशिष्ट जातीचे दगड किंवा लाकडें, वृक्ष वगैरेच्या ठिकाणी इष्टाचा वास कल्पून पूजा करणें. स्तूप, बोधिवृक्ष, प्रभामंडल, उष्णीव किंवा पागोटें, भिक्षापात्र, वज्रासन, हत्ती, सिंह, चक्र वगैरे बौद्ध व जैन प्रतीकें होत. त्याचप्रमाणे निरनिराळी यंत्रे मंडलें; वड, पिंपळ, औदुंबर, तुलसी या सारखे वृक्ष; नर्मदेचे बाण, गण्डकीचे शाळिग्राम, नर्मदेतील गणपती, सूर्यकांत व चंद्रकांतसारखे मणी व यासारख्या इतर वस्तू ब्राह्मण धर्मातील पूजनीय प्रतीकें होत. प्रतिमेचे अस्तित्व येण्यापूर्वी प्रतिकांचाच जास्त प्रचार असावा.
३) इष्टाची मानवाकार प्रतिमा हा आपला मुख्य प्रतिपाद्य विषय होय. निर्गुणाला सगुणाच्या सीमेत बांधून टाकणें, कोणीही न पाहिलेल्याला मानव प्रतिमेच्या रूपाने साकार करून सर्वांच्या समोर वंदनीय व पूजनीय म्हणून उपस्थित करणें सोपे व सहजसाध्य नव्हते. पण अनेक प्रयत्नानंतर ते साध्य केले गेले. असे करीत असतांना प्रतिमेच्या निर्माणाविषयी व तिच्यात देवत्व आणण्याकरिता अनेक नियम बांधले गेले आणि विशिष्ट प्रकारच्या प्रक्रियांची स्थापना झाली.
प्रतिमेला देवत्व प्रदान करणारे हे नियम व प्रक्रिया याची चर्चा म्हणजेच देव प्रतिष्ठा व देवप्रतिमानिर्माण या विषयाची मीमांसा होय. यापैकी पहिला विचार म्हणजे प्रतिमा कशाची व कशी घडवावयाची हा होय.
देवप्रतिमेची माध्यमे :
प्रतिमा निर्माण व लिंगार्चन पद्धतीचा विचार करीत असतांना लक्षण ग्रंथकारांनी अनेक माध्यमांची नांवे दिली आहेत व त्यांच्या तरतम भावाचा ही विचार केला आहे. थोडक्यांत सांगावयाचे म्हणजे ही माध्यमे खालील होत.१) शिला - टिकाऊपणांच्या दृष्टीने हे माध्यम फार चांगले. दगडाच्या जाती, उत्तम दगडाची निवड आणि त्याची परीक्षा हा विषय इतर ग्रंथांपेक्षा नारदीय संहितेत फार सुंदर प्रकारे हाताळला आहे. शिले संबंधी अशाप्रकारच्या माहितीची आजच्या भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने परीक्षा होणे इष्ट आहे.
२) रत्नें - बृहत्कल्पसूत्रा सारख्या काही ग्रंथांनी रत्ननिर्मित प्रतिमांचा शिला वर्गातच समावेश केलेला आहे. वज्र (हिरा), चंद्रकांतमणी, सूर्यकांतमणी, मौतिक (मोती), इंद्रनील, पुष्पराग, स्फटिक, वगैरे रत्नांबरोबर शंख आणि प्रवाळ याचा ही प्रतिमा निर्माणकडे उपयोग करीत असत. अर्थातच रत्नप्रतिमा आकाराने लहान व संख्येने थोड्याच असणार.
३) धातु - प्रतिमा तयार करण्याकरिता उपयोगांत येणाऱ्या धातू लक्षणग्रंथांत 'लोह' या समूहवाचक संज्ञेने उल्लेखिल्या आहेत. नारदीय संहितेत सुवर्ण, रजत, ताम्र आणि आरकूट किंवा पितळ याची चार प्रकारचे लोह म्हणून गणना केली आहे. अपराजितपृच्छेनें ही संख्या आठ सांगून 'अष्टलोह' या नांवाखाली सोनें, रूपें, तांबे, कासें, पितळ, त्रपु किंवा टीन, नाग किंवा शिसे आणि कृष्ण लोह अर्थात् लोखंड अशी यादी दिली आहे. यापैकी कित्येक धातूंच्या प्रतिमा आपण आजही वापरतो. मिश्रित धातूंचा उपयोग ही स्वीकार्य होता.
४) लाकूड - मूर्तीसाठी वापरण्याचे लाकूड चरें पडलेले, भंगलेले, गाठाळलेले किंवा किडलेले नसावे. ते सुंदर असून मजबूत असावे. ज्या वृक्षांचे लाकूड मूर्तिनिर्माणांसाठी योग्य मानले जात असे त्यांची एक मोठी यादी अपराजिपृच्छेनें दिली आहे." तींमध्यें पांढरे व लाल चंदन, देवदारु, शिसवी, शिरीष, अशोक, खैर, पारिजातक, अर्जुनक, बेल, क्षीर (अर्क किंवा मंदार), वगैरे वृक्षांचा उल्लेख आहे. ५) माती - मातीच्या मूर्तीचे दोन प्रकार पक्व अर्थात् भाजलेली व अपक्व म्हणजे कच्ची असें आहेत. तीर्थक्षेत्र, देवमंदीर, पर्वत, नदीतीर किंवा बगीच्यातून मातीचा संग्रह करावयाचा असतो. त्यानंतर निरनिराळे पदार्थ घालून ही माती तयार करतात. माती कमविण्यांची प्रक्रिया नारदीय संहिता, अपराजितपृच्छा, गणेशपुराण" वगैरे ग्रंथांत विस्ताराने वर्णिली आहे. अपक्व आणि पक्व अशा उभय प्रकारच्या प्रतिमा आपणांस मिळतात. अग्निपुराणांप्रमाणें अपक्वापेक्षा पक्क प्रतिमा श्रेष्ठ होत. आज मात्र आपण पार्थिव लिंग, हरतालिका, गणपती, सरस्वती, दुर्गा, वगैरे मूर्तीसाठी अपक्क मातीच वापरतो.
वरील माध्यमांत अग्निपुराणांचे मतानें" श्रेष्ठत्वाची पायरी उतरत्या क्रमानें माती, काष्ठ, शिला, मुक्ता, व नंतर लोह किंवा धातू अशी लागते. जैन ग्रंथ बृहत्कल्पसूत्र यांचा कर्ता 'सेलम्मि' अर्थात् शिला किंवा रत्ने याबी प्रतिमा उत्तम, हस्तिदंताची (दंतम्मि) मध्यम व लाकूड, माती आणि रंगाने काढलेल्या प्रतिमा अधम असें प्रतिपादन करतो. याशिवाय पूजनाचा उद्देश व पूजकाचा वर्ण हे ही प्रतिमेचे तरतम रूप ठरविण्यांस मदत करतात.
६) तात्कालिक माध्यमें - वरील माध्यमांच्या व्यतिरिक्त अग्निपुराणांनें मीठ, तूप आणि कपडा यांना तात्कालिक माध्यम म्हणून उल्लेखिलें आहे. अपराजितपृच्छेने" लिंगार्चनांत कुंकू, कापूर, कस्तूरी, वगैरे द्रव्यें; मातृलिंग, करवीर आणि इतर फळें याचाही माध्यम म्हणून उल्लेख केला आहे. ही सर्व तात्कालिक माध्यमें होत.
याशिवाय शिवलिंगाकरिता 'रस' किंवा पारा ही एक शिष्टमान्य माध्यम होतें. पारा 'बाधण्याची' प्रक्रिया एक अत्यंत क्लिष्ट प्रकारची गोष्ट समजली जाते.
याप्रमाणे एकदा माध्यमांचा निश्चय झाला म्हणजे त्यांचा संग्रह करून प्रतिमा घडवीत असतांना कोणती अनुष्ठानें अथवा मंत्रोच्चार करावयाचे, मुहूर्तादिकांचा कसा विचार करावयाचा, स्थापनेकरता कोणती द्रव्यें वापरावयाची, वगैरे गोष्टीचाही बारकाईने विचार केलेला आहे. तिकडे आपणास वळण्यांचे कारण नाही. फक्त मूर्तीचा आकार ठरविण्यांबद्दल जी मीमांसा केलेली आहे तिच्याकडे आपणांस पाहिले पाहिजे. हा विषय 'तालमान' या नांवाने ओळखला जातो.

तालमान :
पुजेकरिता तयार केलेली प्रतिमा किती मोठी किंवा लहान असावी याचाही स्वतंत्र विचार आहे. मुख्य भेद म्हणजे असा कीं घरांत नित्यपुजेकरिता जर प्रतिमा हवी असली तर 'मत्स्यपुराणा' प्रमाणे ती अंगुष्ठप्रमाण किंवा जास्तीत जास्त बारा अंगुर्ले उंच असावी. मात्र मंदिरांत संस्थापित होणाऱ्या प्रतिमेंस हा नियम लागू नाही. विकल्पाने तिची उंची निरनिराळ्या प्रकारें ठरविली गेली आहे. एका मताप्रमाणें गर्भगृहाच्या दाराच्या उंचीच्या प्रमाणांने तिची उंची असावी. दाराच्या उंचीला आठ भागांत विभक्त करून त्यातील फक्त सात भागांचे बरोबर असे तीन भाग करावयाचे. यापैकी एका भागांइतकी प्रतिमेच्या पीठाची उंची असावी व उरलेल्या दोन भागांएवढी मूर्ती उंच असावी.'अपराजितपृच्छेने' हा विचार थोडा निराळ्याप्रकारे केला आहे. तेथे प्रतिमेची उंची ठरविण्याकरिता चार आधार कल्पिले आहेत - सीमा, गर्भ व द्वार असे तीन आणि चौथा अंगुल हा स्वतंत्र आधार होय. अर्थात् यांच्या विस्तारांत तूर्त आपणास शिरावयाचे नाही. बऱ्याच ठिकाणी देवतेच्या नामांप्रमाणे तिच्या विशिष्ट उंचीची परिमाणे दिली आहेत. लक्षण ग्रंथकारांनी फक्त मुख्य देवाचीच नव्हे तर परिवार देवता, मानवाकृती, इत्यादिकांच्या उंचीचा ही फार बारकाईनें विचार केला आहे. विस्तारभयास्तव फक्त 'विष्णुधर्मोत्तर' पुराणांतील वर्णनांचा नमूना खाली देत आहे.
या पुराणाने अंगुलाला मुख्य आधार मानून एकूण प्रतिमांचे हंस, भद्र मालव्य, रुचक आणि शशक असे पांच वर्ग कल्पिले आहेत, व त्यात खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या मूर्ती समाविष्ट केल्या आहेत :
वर्गनाम उंची प्रतिमा-विषय
१) हंस १०८ अंगुर्ले सर्व देव, वासुदेव-संकर्षण-प्रद्युम्न अनिरुद्ध यांचे गण.
२) भद्र १०६ अंगुर्ले ब्राह्मण, विद्याधर, देव (उपदेव), गंधर्व इत्यादि.
३) मालव्य १०४ अंगुर्ले किन्नर, उरग (नाग), राक्षस, कुलस्त्रिया.
४) रुचक १०० अंगुर्ले यक्ष, वेश्या, साधारण स्त्रिया, वैश्य.
५) शशक ९० अंगुलें प्रधान, मानव, शूद्र.
प्रमाण विवर्जित प्रमथ, पिशाच वगैरे.
उंची मापण्यांचे कोष्टक : -
मौर्य कालापासून मध्यकाळांपर्यंत जवळ जवळ सर्वच लक्षणग्रंथकारांनी उंची मोजण्याचा मुख्य आधार 'अंगुला'ला मानलें व १२ अंगुलांचा एक ताल मानून देव प्रतिमांच्या उंचीचे निर्धारण केले आहे. 'विष्णुधर्मोत्तरपुराण', 'मत्स्यपुराण', 'नारदीय संहिता', 'अभिलाषितार्थ चिंतामणि', 'अपराजितपृच्छा', 'रूपमण्डन', वगैरे ग्रंथांना खाली दिलेले कोष्टक मान्य आहे. (देवतामूर्ति प्रकरणकारांने मात्र हे कोष्टक आठ चे न मानतां दशगुणमान् म्हणजे १० चे स्वीकारले आहे (देवता २ पान ४२) फक्त काही ठिकाणीं नांवाचा फरक आढळतो.८ परमाणु = १ त्रसरेणु, किंवा १ रथरेणु
८ त्रसरेणु = १ बालाग्र
८ बालाग्र = १ लिक्षा
८ लिक्षा = १ युका किंवा युकामध्य
८ युका = १ यव किंवा यवमध्य
८ यव = १ अंगुल किंवा मात्रा
२ अंगुर्ले = १ गोलक
४ अंगुर्ले किंवा मात्रा = १ भाग
३ भाग किंवा १२ अंगुलें = १ वितस्ति किंवा ताल
कौटिल्यानें आपल्या अर्थशास्त्रांतही उंची मोजण्यांचे असेंच परिमाण दिले आहे, पण तेथें एक मोठा फरक लक्षांत ठेवण्यासारखा आहे. कौटिल्यानें खालील प्रकारे कोष्टक दिले आहे.
८ रथरेणु = १ लिक्षा
८ लिक्षा = १ यूकामध्य
८ यूकामध्य = १ अंगुल
८ यवमध्य = १ अंगुल
४ अंगुले = १ धनुग्रह
२ धनुग्रह = १ धनुर्मुष्टि
३ धनुग्रह किंवा १२ अंगुलें = १ वितस्ति किंवा छायापौरुष (१ ताल)
वरील कोष्टक बारकाईने पाहताच लक्षात येईल की कौटिल्याने 'बालाग्र' या परिमाणाची मोजणी केलेली नाही. त्यामुळे कौटिल्याची एक लिक्षा जरी त्याच्या ८ रथरेणु बरोबर म्हणजे ६४ परमाणु बरोबर असली तरी इतरांच्या मताप्रमाणे ती ८ x ८ x ८ = ५१२ परमाणुबरोबर होईल. याच अनुपाताने कौटिल्याची १२ अंगुर्ले = विर्तास्तही इतरांच्या वितस्ति किंवा तालांपेक्षा लहान होतील.
अंगुलांचे मान :
आता मुख्य विचारणीय प्रश्न असा की अंगुलांचे मान काय गृहीत धरीत, " हे एकरूप असले तरच कोष्टकांप्रमाणे झालेली मोजणी सर्वत्र एकरूप असणार. मूळात येथेच एकरूपता दिसत नाही. कौटिल्याने दोन परंपराचा उल्लेख केला आहे. एक तर 'अंगुल' म्हणजे मध्यमपुरुषांच्या मधल्या बोटाचा मधला भाग ह्या अंगुलाला पुढे 'मात्रांगुल' असे म्हणू लागले. दुसरे म्हणजे 'अष्टौयवमध्याः अंगुलम्' अर्थात् आठ यवमध्य म्हणजे एक अंगुल. याला 'मानांगुल' असे ओळखतात. पण यवमध्य तरी काटेकोरपणे कसा निश्चित होणार?
कारण बरील कोष्टक पाहूं जाता परमाणु ते यूकेपर्यंतचे मान परिमाण फारच सूक्ष्म आहे. अर्थात् मूर्ती निर्माणात ही त्याचा प्रयोग क्वचितच होत असे. अंगुलमानांची अडचण इतर ग्रंथकारांनाही सलली असावी. मत्स्यपुराणकारांनी असे विधान केले आहे की स्वतःच्या अंगुलिमानाने प्रतिमेचे मुख बारा अंगुलांचे करावे व त्याचप्रमाणे इतर अवयवाची प्रकल्पना करावी.
मत्स्यपुराणांचे हे विधान बाराव्या शतकांत लिहिलेल्या अपराजितपृच्छेनेही अक्षरशः उचलून धरले आहे. " अर्थात् हे 'स्वकीय अंगुल' म्हणजे मूर्तीच्या मालकाचे, उपासकाचे की शिल्पकाराचे याचा उलगडा होत नाही. शक्यता अशी वाटते की परिस्थिती, आवश्यकता, सोय किंवा इच्छेच्या अनुरुप अंगुलमानांत परिवर्तन करीत व त्याप्रमाणें मुखमानांचा निश्चय करून संपूर्ण मूर्ती घडवीत असत.
सारांश असा की १२ अंगुलांचा एक ताल हे व्यावहारिक मान सर्वग्राह्य होते व तालाला मोजणीचा प्रमुख आधार मानून प्रतिमेच्या उंचीस अष्टताल, नवताल, दशताल अशी निरनिराळी अभिधाने दिली जात. एकूण मोजणीला 'तालमान' असे म्हणण्यांत येत असे.
साधारणपणे देवप्रतिमा नऊ किंवा दहाताल उंचीच्या म्हणजे १०८ किंवा १२० अंगुले उंचीच्या करण्याचे सर्वमान्य विधान आहे. इतर प्रतिमा निरनिराळ्या मतांप्रमाणे १ तालापासून १९ तालांपर्यंत उंचीच्या सांगण्यात आल्या आहेत. प्रतिमेच्या उंची प्रमाणे तिच्या अवयवांच्या उंचीचे प्रमाण कसे बदलते याचाही विचार लक्षणग्रंथांत आढळतो व डॉ. बॅनर्जी यांनी आपल्या पुस्तकांत त्याचा आढावाही घेतला आहे." तिकडे न शिरता जुन्या काळापासून मध्यकालापर्यंतच्या काही निवडक ग्रंथकाराचा देवप्रतिमांच्या उंची विषयी काय कल आहे हे वेगळ्या तक्त्यांत दाखवून हा विषय आटोपता घेतो.
महाराष्ट्रातील शिल्प व चित्रकला

दगडी शिल्पांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कलेत आढळणारे सातत्य माती आणि धातूंच्या माध्यमात बनविलेल्या शिल्पांमध्ये आढळून येत नाही. दगडी शिल्पांची संख्या इतर माध्यमातील शिल्पांपेक्षा खूपच अधिक आहे. एकाश्मक माध्यमाला त्याचे स्वतःचे असे फायदे आणि मर्यादा असल्यामुळे त्यानुसार विशिष्ट वास्तुशास्त्रीय विकासाचा कालानुक्रम ठरविणे कठीण जाते असे निराळ्या संदर्भात या आधीच नमूद करण्यात आले आहे. बांधीव मंदिरस्थापत्यातील स्तंभ, मंदिराचे एकूण दृश्य आणि तलविन्यास यांची लयनस्थापत्यातील त्याच प्रकारच्या घटकांशी तुलना करता येत नाही हे ही यापूर्वी नमूद केलेले आहे. अजिंठा येथील रंगचित्रांतून व्यक्त होणाऱ्या वास्तूशास्त्रीय नमुन्यांचे प्रत्यक्ष लेण्यांशी असलेले साम्य अत्यंत मर्यादित आहे. एकाश्मक वास्तू खोदतांना स्थपतीला मिळणारे स्वातंत्र्य आणिस त्यातून उद्भवणारे सौंदर्याचे निराळे संकेत हे त्याचे मुख्य कारण असावे. तथापि, या स्वातंत्र्यामुळे शिल्पांमध्ये मात्र फारसा फरक पडला नाही. निराळ्या शब्दात सांगायचे तर, बांधीव मंदिरातील शिल्पे आणि लेण्यातील शिल्पे यामध्ये फारसा फरक पडला नाही. एकाच काळातील लेणी व बांधीव मंदिरे अभ्यासल्यास ही बाब विशेषत्वाने जाणवते. म्हणूनच आपण अभ्यासार्थ निवडलेल्या कालखंडात अश्मशिल्पांमध्ये अखंड सातत्य किंवा शैलीच्या विकासातील सलगता आढळते.
नाशिक, कोल्हापूर, नेवासे, पैठण, भोकरघन, तेर, आडम आणि पवनार ह्या पूर्वेतिहासिक स्थळी आढळणाऱ्या मृण्मूर्ती उल्लेखनीय आहेत. या मोजक्याच स्थळी सातवाहनकालीन मृदमूर्ती मोठ्या संख्येने आढळतात. नंतरच्या काळात उल्लेखनीय मृदमूर्ती फारशा आढळत नाहीत. याला अपवाद असलेल्या तेर या एकमेव ठिकाणी अक्षरशः हजारोंनी मृदमूर्ती आढळल्या आहेत. अशा प्रकारे प्राचीन महाराष्ट्रातील कलेचा थोडक्यात आढावा घेता येतो. शिल्पांचा कालखंडपरत्वे तपशील पुढीलप्रमाणे आहे.
इतिहासपसूर्व काळ :-
दायमाबाद या ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष असलेल्या स्थळी आढळलेली ब्राँझ मूर्तिशिल्पे ही गेल्या पंचवीस वर्षातील शोधांपैकी एक आश्चर्य असून या मूर्तिशिल्पांची उंची २० ते २५ सें. मी व वजन ८ ते २० कि.ग्रॅ. आहे. त्यांच्या आकार आणि वजनांमुळे त्या केवळ समकालीनच नाही, तर नंतरच्या काळातीलही ब्राँझ मूर्तीपेक्षा वेगळ्या ठरल्या आहेत. या सर्व ओतीव भरीव मूर्ती असून त्यात तीन प्राण्यांच्या आणि एका सारथाच्या मूर्तीचा समावेश आहे. हे तीन प्राणी म्हणजे हत्ती, गेंडा आणि वशिंड नसलेला बैल होत. रथालाही बैल जोडले आहेत. या सर्व मूर्तीची पूजा होत असे. तीन मूर्तीची चाके आजही टिकून आहेत, तर चौथ्या मूर्तीला एकेकाळी चाके असल्याचे स्पष्ट पुरावे आहेत. रथाच्या पुढच्या अंगाला सारथ्याला उभे राहण्यास जागा आहे. या रथाची धुरा वाजवीपेक्षा अधिक लांब असून तिला बैल बांधण्यासाठी जू आहे. या धुरेच्या स्थानाजवळील भागावर एक कुत्रा उभा आहे. सारथ्याची मूर्ती ओबडधोबड पण विलक्षण आहे. ही मूर्ती धार्मिक स्वरुपाची असावी, कारण हा सारथी ऊर्ध्वलिंगी आहे. या मूर्तीच्या रासायनिक विश्लेषणात सोमल (arsenic) आढळून आले आहे. त्याचप्रमाणे या मूर्तीचे तंत्र लक्षात घेता या मूर्ती सिंधू-सरस्वतीच्या खोऱ्यातील मूर्तीच्या परंपरेतील आहेत असे म्हणत येईल.पूर्वेतिहासिक काळ (इ. स. पूर्व २ रे शतक ते इ.स. ३ रे शतक)
या काळात महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातील डोंगरांमध्ये बौद्ध भिक्षंकरिता शैलगृहे खोदण्यात आली. याआधीच आढावा घेतल्याप्रमाणे भाजे, कोंडाणे, औरंगाबाद, पितळखोरे, नाशिक, कार्ले, बेडसे, महाकाली आणि कान्हेरी ही या सुरुवातीच्या टप्प्यातील प्रमुख केंद्र होती. अगदी अलीकडेच नागपूर परिसरात चंडाळ्याच्या जंगलात सुरुवातीच्या टप्यातील शैलगृहे सापडली आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे याच काळातील एक बांधीव स्तूप सापडला आहे. या सुरुवातीच्या टप्यातील शैलगृहांमध्ये मोठ्या संख्येने नसली, तरी शिल्पे आढळतात. गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळानंतर, म्हणजेच इ.स. १०० नंतर माणसांची आणि प्राण्यांची मूर्तिशिल्पे मोठ्या संख्येने आढळतात. म्हणून शिल्पांच्या दृष्टिकोनातून फक्त कोंडाणे, पितळखोरे, कार्ले, आणि पवनी एवढ्यासच स्थळांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. या दोनशे वर्षाच्या कालखंडात चैत्यगृहाच्या आणि विहाराच्या स्थापत्यात खूपच विकास झाला तरी शिल्पकलेत मात्र फारसा विकास झाला नाही हे विद्या दहेजिया यांचे निरीक्षण अगदी योग्यच आहे. या कालखंडात शिल्पांचे एवढे दुर्भिक्ष आहे की, शिल्पांची अत्यल्पता हे या टप्याचे एक वैशिष्ट्यच बनून गेले आहे.या काळात आढळणाऱ्या मूर्तिशिल्पांमध्ये मुखभागावर कोरलेल्या भक्तांच्या मूर्ती, स्तंभशीर्षाना अलंकृत करणारी व्यालशिल्पे, यक्षमूर्ती आणि दंपतीशिल्पे यांचा समावेश होतो. पवनी स्तूपावरील शिल्पांमध्ये स्तूपाभोवतीच्या कठड्याच्या उभ्या खांबांवर कोरलेले भक्तगण आणि कठड्याच्या उष्णीषावरील अलंकरणात्मक शिल्प यांचा समावेश होतो

पवनी येथील स्तूपाच्या कठड्याच्या स्तंभांवरील शिल्पांचा विचार केल्याखेरीज सातवाहन शिल्पाच्या किंवा पूर्वेतिहासिक कलेच्या या टप्याच्या विवेचनाची सांगता होणार नाही. पश्चिम भारतातील लेण्यांप्रमाणेच येथेही पशुपक्ष्यांनी युक्त अशा उभ्या कमलपट्टांची प्रयोजने आहेत. येथे कोरण्यात आलेल्या मानवाकृती, त्यांचे पोशाख आणि अलंकार यांची घाटणी आधी वर्णिलेल्या शिल्पाकृतींसारखीच आहे, फक्त कधीकधी चेहऱ्याची ठेवण थोडी निराळी आढळते. ही ठेवण काहीशी लाकडी मुखवट्यासारखी किंवा आदिवासींच्या उठावशिल्पांसारखी आहे. नेमक्या याच विशिष्ट बार्बीमुळे विदर्भातील शिल्प पश्चिम भारतातील नागरी शिल्पांपेक्षा निराळे आहे. या संदर्भात श्री एस. के. सरस्वती यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद घेणे उचित ठरेल. त्यांच्या मते अगदी पश्चिम भारतीय लेण्यांमधीलल शिल्पांमध्येही काही स्थानिक घटक आढळतात. व या घटकांमुळे त्यांच्या समकालीन असलेल्या सांची आणि भारहूत येथील शुंग आणि शुंगोत्तर शिल्पांपेक्षा ती निराळी ओळखू येतात. उत्तर भारतात भरीव नागरीकरणाला सुरुवात झाली. ही प्रक्रिया महाराष्ट्रात येऊन थांबली किंवा पुढे या प्रक्रियेची तीव्रता फारशी टिकली नाही. ही नागरीकरणाची किंवा शहरीकरणाची प्रक्रिया अगदी लाटा याव्यात तशी झाली. उत्तरोत्तर येणाऱ्या शहरीकरणाच्या लाटा अधिकाधिक अंतर्भागापर्यंत पोहचल्या व त्यांनी संस्कृतीच्या विविध अंगातील स्थानिक घटक सामावून घेतले. शिल्पकला हे संस्कृतीचे अशाच प्रकारचे अंग आहे. हे अंग निरनिराळ्या कालखंडातील शहरीकरणाचे विविध टप्पे आणि तीव्रता स्पष्टपणे दाखविते.
सातवाहन काळाच्या दुसऱ्या टप्यात गौतमीपुत्र सातकर्णीच्या नंतरच्या काळातील लेण्यामधील शिल्प या टप्याचे प्रतिनिधित्व करते. या काळातील लेण्यांमध्ये माणसांची आणि प्राण्यांची शिल्पे अधिक ठळकपणे आणि मोठ्या संख्येने आढळतात. नाशिक येथील लेणे क्र. ३ व कार्ले येथील चैत्यगृहामध्ये लेण्याच्या तळभागाच्या तुळ्या पेलणारे कीचक (batlantesi) दाखविले आहेत. स्तंभशीर्षावर व्याल आणि स्क्फिंक्ससारख्या प्राण्यांवर बसलेली भक्ती दांपत्ये दाखविली आहेत. नाशिक येथील लेणे क्र. ३ मध्ये एक कमान असून कमानीच्या द्धारांच्या खांबांवर उभ्या पट्टांमध्ये मिथुन-दृश्ये, तर द्वाराच्या दोन्ही बाजूस यक्षमूर्ती दाखविल्या आहेत. कार्ले येथे वरच्या भागात निरनिराळ्या मजल्यांवर, उडणारी गंधर्वयुगुले दाखविली आहेत, तर खाली लेण्याच्या बाह्यभागात मुख्य भागाशी काटकोनात असलेल्या एकमेकांसमोरील भिंतींवर हत्तींचे पट्ट असून द्वाराच्या दुतर्फा देणगीदार दांपत्ये कोरलेली आहेत.
बहुधा याच काळात मानवी शिल्पाकृती अतुल सौंदर्याप्रत पोचल्या. या काळातील भक्तांनी आणि शिल्पकारांनी भगवान बुद्धाला मानवी स्वरुपात पाहणे पसंत केले. अजूनही स्तूपाचे मुख्य पूजावस्तू म्हणून महत्त्व होतेच. चैत्यगृहातील मध्यायताच्या मागे असलेले त्याचे महत्त्वपूर्ण स्थान अबाधित राहिले. इ.स. च्या तिसऱ्या शतकाच्या पहिल्या दशकांमध्ये कान्हेरी येथील चैत्यगृहाच्या प्रांगणातील स्तंभाच्या पायावर आणि शीर्षावर बुद्धमूर्ती आहे. त्यातील एक बुद्धमूर्ती उभी असून एक बसलेली आहे. अमरावतीला बुद्धमूर्ती घडविण्यात आल्या. त्यापासून प्रेरणा घेऊन येथे या मूर्ती कोरल्या गेल्या असाव्यात. स्तंभावर नेहमी आढळणाऱ्या कमलपट्टाव्यतिरिक्त आढळून येणारे नवे वैशिष्ट्य म्हणजे स्तूपाभोवतालच्या कठड्याच्या साहचर्यात आढळणारे प्राण्यांचे व गुराख्यांचे पट्ट होय. हे वैशिष्ट्य गौतमीपुत्रोत्तर सर्व लेण्यांमध्ये, म्हणजे नाशिक, कुडा व कान्हेरी येथे आढळते. स्तूपाची पूजा करणारे आणि त्यापुढे नतमस्तक झालेले भक्तजन दाखविणाऱ्या, त्याचप्रमाणे बैल, सिंह, हत्ती आणि अगदी उंटही दाखविणाऱ्या पट्टांचे पश्चिम भारतातील लेण्यांमधील शिल्पांशी आणि अमरावती येथील शिल्पकलेशीही साधर्म्य आहे.

तेर येथील स्तूपाच्या कठड्यावरील किंवा वेदिकेवरील दगडी शिल्पे अमरावती या प्रसिद्ध सातवाहन स्थळी आढळणाऱ्या शिल्पशैलीची प्रकर्षाने आठवण करुन देतात. तेरणा नदीच्या पलीकडे स्तूपाचे काही अवशेष आढळले आणि त्या ठिकाणी मो. गं. दीक्षित यांनी उत्खनन केले, त्याची माहिती या आधीच देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वरंडीच्या दगडाचे (coping stone), कठड्याच्या स्तंभाचे, कमपलट्ट असलेल्या कठड्याच्या आडव्या सूची आणि स्तूप दाखविलेल्या आयागपट्टांचे दगडी अवशेष सापडल्याचा उल्लेखही याआधी येऊन गेलेला आहे. या अवशेषांचे अमरावती येथील शिल्पांशी असलेले शैलीतील साधर्म्य शिल्पांसाठी वापरण्यात आलेल्या एकाच प्रकारच्या चुनखडीच्या दगडामुळे अधिक बळकट झाले आहे. वास्तव्यस्थळी आढळलेल्या चुनखडीच्या दगडात घडविलेल्या अशाच प्रकारच्या वस्तू (उदा. शिल्पफलक फरशा (Plaque) आणि मानव मूर्तिशिल्प) मूर्तिशिल्प बनविण्याकरीता या भागात चुनखडीचा दगड लोकप्रिय असल्याची साक्ष देतात. या ठिकाणी शैव मंदिराशी संबंधित असलेला एक स्तंभ आढळला असून या स्तंभावर वासिष्ठीपुत्र पुळुमावीच्या काळातील शिलालेख आहे. हा स्तंभही चुनखडीच्या दगडातच कोरलेला आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता अशा प्रकारच्या कलावशेषांचा काळ फार मागे नसला तरी किमान इ.स. च्या दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धातील असावा. अशा उल्लेखनीय कलावस्तूंमध्ये एकावर एक अशा चार छत्र्या असलेल्या स्तूपाची पूजा व वंदन करणारे नाग दाखविणारा फलक, आत आत जाणाऱ्या वर्तुळांमध्ये कमळे आणि हंस दाखविणारी कमळाची वेल मगर बाहेर टाकत आहे असे दृश्य असलेला फलक आणि लंबगोलामध्ये दाखविलेला दाढीवाल्या माणसाचा चेहरा इत्यादी कलावस्तूंचा समावेश होतो. डोळयाची बुब्बुळे आणि डोळे अगदी नाजुकपणे कोरलेल्या लंबगोलाकार चेहऱ्यामध्ये अमरावती शैलीची सर्व वैशिष्ट्ये आहेत. हे डोके किंवा चेहरा राजघराण्यातील व्यक्तीचा असावा. डोक्याच्या केसांना बांधलेल्या चूडामणीवरुन हे अनुमान निघते. या काळातील लज्जागौरींचे अनेक फलक आढळले आहेत. जड कर्णवलये आणि मेखला एवढीच आभूषणे आणि डोके कमळाच्या स्वरुपात दाखविण्याची पद्धती या दोन बाबी हे फलक उत्तरसातवाहनकालीन असल्याचे सूचित करतात.
या ठिकाणच्या शिल्पकलेमध्ये येथील मृशिल्पांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारीक नक्षीकाम असलेली भांडी, विविध प्रयोजने असलेली पदके (१त्त्ग्दहछ), मातीचे दिवे, मकरिका, पशुमूर्ती, घोडे, हत्ती, मातृदेवता आणि कुमारासारखे देव यांची मूर्तिशिल्पे लक्षात घेता सातवाहन काळातील नंतरच्या टप्यात दुहेरी साच्याच्या पद्धतीचा अंगिकार करण्यात आलेला दिसतो. पदकांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे प्रयोजन म्हणजे गजलक्ष्मी. त्यात रोमन बुलैच्या (पदक) प्रतिकृतीही आढळतात. पुनरुक्ती झालेल्या शिल्पाचे उदाहरण म्हणजे मातृदेवतेची मूर्ती. तिच्या उजव्या हातात आंब्याची डहाळी असून डाव्या हातात पक्षी पकडला आहे. अशीच प्रयोजने असलेल्या आणि पाय फाकविलेल्या स्थितीत असलेल्या बालकांच्या मूर्तीही आढळल्या आहेत. या मूर्ती घोड्यावरील खार म्हणून बनविल्या असून घोडयाच्या मृण्मूर्ती स्वतंत्रपणे बनवून नंतर त्या एकत्र जोडण्यात येत असाव्यात या निष्कर्षप्रत विद्धान आले आहेत. यातील बऱ्याचशा मातृदेवतेच्या आणि बालकांच्या मूर्ती आतून पोकळ असून त्यांची मोठी संख्या लक्षात घेता ह्या मूर्ती नवसाच्या म्हणजे लहान मुलांना होणारी रोगराई टाळण्यासाठी अर्पित केल्या
जाणाऱ्या असाव्यात. काही मूर्तीवर, विशेषतः पणतीचे अलंकरण करणाऱ्या मूर्तीवर परकीय प्रभाव दिसून येतो. डोक्याचे स्वरुप दिलेल्या अशा एका पणतीवर सिथियन वैशिष्टये आणि कुल्हा प्रकाराची टोपी आढळते. दुसऱ्या एका नमुन्यात डोक्याच्या भागावर ग्रीकोद्भव वैशिष्टये आढळतात. या शिल्पात वापरण्यात आलेले प्रगत तंत्र, मानवी मूर्तीची वेगळी वैशिष्ट्ये आणि या पुरावस्तूंचे आगळेवेगळे स्वरुप इत्यादी बाबींवरुन येथील लोकांचा ग्रीक प्रभाव असलेल्यास कलाकारांशी थेट संपर्क होता असे म्हणता येईल.
तेर येथे सापडलेल्या हाडाच्या आणि हस्तिदंती कंगव्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. हाडातील नमुना हस्तिदंती क्रंगव्यापेक्षा थोडा ओबडधोबड किंवा अपरिपक्व असून तो तेरमधील कुंडाच्या उत्खननात सापडला आहे. दोन्ही कंगव्यांवर केस विंचरणारी स्त्री कोरली आहे. हस्तिदंती कंगव्यावर मागच्या बाजूस लक्ष्मीला हत्ती अभिषेक करत असल्याचे दृश्य कोरले आहे. हा कंगवा हस्तिदंती कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. तेर येथे हस्तिदंती कोरीवकाम करणाऱ्यांची श्रेणी (संघटना) होती. हंसाचा आकार असलेला केसांचा आकडा या वसतूचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. मौल्यवान खडे, नाण्यांचे साचे, विविध प्रकारच्या माळा व ताईत इत्यादी अवशेष तेर हे कलाकौशल्याचे समृद्ध केंद्र असावे हेच दाखवून देतात.
वाकाटक शिल्प :-
सातवाहनांच्या अस्तानंतर दख्खनवर राज्य करणारे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे वाकाटक. वाकाटक नृपति हरिषेण (इ.स. ४६५-४९०) व त्याचा मंत्री वराहदेव यांचे शिलालेख वाकाटकांचा प्रभाव संपूर्ण दख्खनवर, म्हणजे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंतच्या प्रदेशावर असल्याची साक्ष देतात. काही वाकाटक नृपति हे गुप्त सम्रांटाचे समकालीन असले तरी वाकाटक राजघराणे गुप्त साम्राज्याच्या उदयाच्या अर्ध्या शतकापूर्वीच महत्त्वाची राजसत्ता म्हणून प्रस्थापित झालेले होते. विशेष म्हणजे ते इ.स. च्या पाचव्या शतकाच्या मध्यात गुप्तांचा हास झाल्यानंतरही महत्त्वाची सत्ता म्हणून टिकून राहिले होते. वाकाटकांची स्थापत्य, शिल्प आणि चित्रकलेच्या क्षेत्रातील अजिंठा येथील निर्मिती विचारात घेता वास्तुशास्त्र किंवा स्थापत्य व दृक्कलेचे (visual arts) आश्रयदाते म्हणून त्यांचे असलेले महत्त्व लक्षात येते. एकेकाळी वाकाटकांचा काळ इ.स. चे आठवे शतक मानला जात असे आणि त्यामुळे अजिंठा येथील चित्रकला व शिल्पकलेचे परस्परपूरक अद्वितीसयत्वाकडे (Singular nature) दुर्लक्ष होत असे. परिणामी भारताच्या वैभवशाली काळातील किंवा अभिजात युगातील (classical age) कलेची चर्चा करताना त्यात अजिंठा येथील कलेचा विचार केला जात नसे. तरीसुद्धा सौंदर्यशास्त्रीय निकष लावून या भूमिकेचे समर्थन करण्याचेही प्रयत्न झाले. तथापि गेल्या पन्नास वर्षात पुराभिलेखविद्या, राजकीय आणि कलेचा इतिहास या क्षेत्रात झालेल्या महत्त्वपूर्व संशोधनामुळे भारतातील अभिजात कलेचे वर्णन नुसते, "गुप्त कला" असे न करता "गुप्त-वाकाटक कला" असे केले पाहिजे हे आता सर्वमान्य झाले आहे, किंबहुना अजिंठा येथील रंगचित्रे जर उजेडात आली नसती तर प्राचीन भारतीय चित्रकलेचे आणि अभिजातयुगातील चित्रकलेच्या भारतात आणिस भारताबाहेर पडलेल्या प्रभावाचे आकलन अपूर्ण राहिले असते.
अजिंठा येथील प्रामुख्याने बौद्ध असलेली शिल्पे सारनाथच्या अभिजात शिल्पांपेक्षा वेगळी आहेत. सारनाथ येथील ध्यानमग्न उभा किंवा बसलेला बुद्ध, त्याचे अर्धोन्मीलित डोळे, शरीराला टेकलेल्या वस्त्रांच्या चुण्यांवरुनच त्याच्या शरीरयष्टीचा येणारा अंदाज इत्यादी वैशिष्ट्ये असलेली शिल्पे म्हणजे सौदर्याचे आगळेवेगळे स्वरुप आहे. शाक्य बुद्धाच्या अशा त-हेच्या मूर्ती भौतिक शरीर दाखवित असल्या तरी ते उच्च दर्जाच्या आकाशमय विश्वातून अवतरीत होत असल्यासासरखे भासते. अजिंठा येथील बुद्धमूर्तीमध्ये तत्कालीन कलेची सौंदर्यशास्त्रीय वैशिष्ट्ये, शरीराच्या प्रमाणाचे संकेत आणि महापुरुषाची उष्णीषादि लक्ष्मणे इत्यादि बाबी दिसून येत असल्या तरी या मूर्ती अधिक भौतिक आणि भरीव वाटतात. भक्तांना तारण्यासाठी अवलोकितेश्वराचे स्वर्गातून होणारे अवतरण, बुद्धाचा परितोष, परिनिर्वाण, स्वतःची पत्नी व पुत्र यांच्यासमोर भिक्षा मागण्यासाठी उभा असलेला बुद्ध, दीपंकर जातक असे धार्मिक विषय अजिंठा येथे चित्रित करण्यात आले आहेत. ही शिल्पे केवळ कथाविवरणशैलीमुळे नव्हे, तर मूर्ती कोरण्याकरिता वापरलेली पद्धती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे निरनिराळ्या भावना आणि वृत्तींचा सुंदर आविष्कर या गुणांमुळे उल्लेखनीय ठरली आहेत. दुय्यम शिल्पांमध्ये राजेशाही नाग-युगुल, लेण्याच्या कळसावरील शिल्प (standard bearer)] यक्ष द्वारपाल आणि त्यांचे अनुचर, जलदेवता आणि त्यांचे गबाळ अनुचर व ठेंगू लवाजमा हे सारे प्रेक्षकास निराळ्या असणाऱ्या दिव्य विश्वात घेऊन जातात. हे विश्व परलोकातील किंवा श्रेष्ठ लोकातील असले तरी ते मानवी भावनांनी ओतप्रोत भरलेले असल्यामुळे मानवीच भासते.
गेल्या तीस वर्षात पूर्व विदर्भात उजेडात आलेला कलेच्या इतिहासातील पुरावा विचारात घेतल्याखेरीज वाकाटक शिल्पाचा आढावा पूर्ण होणारा नाही. वाकाटक राजघराण्याच्या दोन शाखा होत्या. अजिंठा येथील कलेला वत्सगुल्म (सध्याचे वाशीम) येथील शाखेचा राजाश्रय होता तर दुसरी शाखा (बहुधा ही शाखा अधिक प्राचीन होती) प्रथम नंदीवर्धन (सध्याचे नगरधन) येथून आणि नंतर प्रवरपूर येथून राज्य करीत होती. या प्रवरपुराचा नेमका ठावठिकाणा अद्यापही गवसलेला नाही. गेल्या तीन दशकात झालेल्या अन्वेषणांनी वाकाटककालीन कलेतिहासिक अवशेष असलेली अनेक स्थळे उजेडात आणली आहेत. रामटेक (प्राचीन रामगिरी) जवळील नगरधन परिसरातील नांदपूर, हमलापुरी आणि मन्सर, पारशिवनी परिसरातील पेंच नदीच्या तीरावरील नांदपूर, वर्धा जिल्हयातील धाम नदीच्या तीरावर बसलेले पवनार (पद्मनगर), नागपूर जिल्ह्यातील मांढळ, गोगाव (जिल्हा चंद्रपूर) आणि मूलचेरा (जिल्हा गडचिरोली) व भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरा ही त्यातील उल्लेखनीय स्थळे होत. अगदी गेल्या दशकापर्यंत वाशीममध्ये कलेइतिहासातील अवशेष सापडले नव्हते. पण अन्वेषणांमुळे आणि उत्खननामुळे याच गावात काही शिल्पे, मूर्ती आणिस विटांनी बांधलेल्या मंदिरांचे अवशेष उजेडात आले आहेत. या सर्व स्थळांमध्ये रामटेकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ठिकाणी झालेल्या गवेषणामुळे आणि जतन कामामुळे वाकाटककालीन शिलालेख असलेली सहा मंदिरे आणि प्रा. मिराशी यांनी अभ्यासिलेल्या शिल्प व मूर्तीव्यतिरिक्त आणखी काही शिल्पे व मूर्ती उजेडात आल्या आहेत.
ह्या मूर्ती आणि शिल्पे शैलीच्या दृष्टिकोनातून सांची येथील सुरुवातीच्या शिल्पांशी साधर्म्य दाखविणाऱ्या पवनीसारख्या पूर्वीपासूनच ज्ञात असलेल्या स्थळी आढळणाऱ्या मूर्ती आणि शिल्पांपेक्षा निश्चितच निराळी आहेत. त्यांच्यामध्ये गंगेच्या खोऱ्यातील अभिजात शिल्पकलेची काही वैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसून येतात. ही वैशिष्ट्ये फक्त वेषभूषा, दागिने, कपडे किंवा ते शिल्पाकृतीत कसे दाखवावेत याबाबतचे संकेत एवढ्यापुरतीच मर्यादित नाहीत. या वैशिष्यामध्ये ज्येष्ठ देव आणि कनिष्ठ देव यांच्यातील फरक कसा स्पष्ट करावा, त्यांची उंची व इतर प्रमाणे, त्यांचे चेहरे, नाक, कान, डोळे, बोटे, टाचा यांसारखे अवयव कसे असावेत याबाबतच्या संकेतांचाही समावेश होतो. शिवाय बसण्याच्या व उमे राहण्याच्या पद्धती, त्यात शिल्पकाराला मिळणारे स्वातंत्र्य, त्याचप्रमाणे हावभाव आणि चेहऱ्यावरील भाव-भावना इत्यादी बाबीही विंध्य पर्वतापलिकडे उत्क्रांत झालेल्या अभिजात शिल्पशैलीशी मिळत्याजुळत्या आहेत.
या नंतरच्या विकासाच्या टप्यात रामटेक आणि त्याच्या परिसरातील मूर्तीचा समावेश होतो. बऱ्यापैकी झीज झालेली त्रिविक्रमाची अष्टभुज मूर्ती वाकाटककालीन असल्याची माहिती डॉ. वा. वि. मिराशीच्या लिखाणामुळे अगोदरच उजेडात आली होती. पण रामटेक येथे केलेल्या जतनकामात केवलनरसिंह आणि रुद्रनरसिंहाच्या मूर्तीचे मूळ स्वरुप उजेडात आले. साफसफाईचे काम चालू असता दोन महाकाय द्वारपालांचा शोध लागला. त्रिविक्रमाच्या मूर्तीची खूपच झीज झाली असल्याने तिच्या मूर्तिशैलीच्या वैशिष्ट्यांचा शोध घेण्यासाठी खूप बारकाईने निरीक्षण करावे लागले. तथापि येथील वराह आणि दोन नरसिंह मूर्तीवरील शेंदूर आणि तेलाचे थर काढून टाकल्यानंतर त्यांच्या शैलीची वैशिष्ट्ये आता स्पष्ट झाली आहेत. हे केवलनरसिंहाचे स्वरुप वाकाटकांच्या राज्यात खूपच लोकप्रिय असावे असे दिसते. या अशा त-हेच्या मूर्ती नंतरच्या काळात देवगड (मध्य प्रदेश) येथे दिसून येतात. अशाच धाटणीचे केवलनरसिंह असलेले पट (plaquest) नागपूर जिल्ह्यात नगरधन आणि नांदपूर व वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे आढळले आहेत. या मूर्तीवर फारसे श्रीमंती दागदागिने किंवा वस्तू नाहीत. हा सिंहमुखी केवलनरसिंह राजासारखा बसला आहे. मक्तांच्या मनात त्याच्याबद्दल आदर आणि दबदबा निर्माण करण्यासाठी शिल्पकाराला या मूर्तीला आणखी हात देण्याची आवश्यकता भासली नाही. केवलनरसिंहाने पायाचा एक गुडघा किंचित उंचावला असून त्यावर त्याचा चक्रधारी हात विसावला आहे, तर दुसरा हात दुमडलेल्या पायाजवळ भक्कमपणे विसावला आहे. एक कंठी आणि पाठीवर रुळणारे केस बांधणारी रत्नमाला हे दोन दागिने सोडले तर मूर्तीवर अन्य कोणतेही दागिने नाहीत. या दोन नरसिंहमूर्ती भारतातील अभिजात शिल्पकलेच्या उच्चतम अभिव्यक्ती आहेत. त्याच टेकडीवर पाच आमलक आणि कलशाने युक्त अशा साध्या मंडपात राजेशाही थाटात उभ्या असलेल्या वराहाची मूर्ती आहे. ही मूर्ती वाकाटक शिल्पींची एक श्रेष्ठ कलाकृती आहे. ही महाकाय वराहमूर्ती बेसॉल्टच्या दगडात खोदलेली असून नितळ कोरीव अवयवांद्वारे तिचे ऐश्वर्य दिसून येते. या मूर्तीवर अलंकरणात्मक प्रयोजने नाहीत किंवा त्यातील पशुशरीराचे तपशील काटेकोरपणे दाखविण्याची काळजी घेतलेली नाही. हा देवाचा अनावृत अवतार खोल पाण्यातील नागाच्या वेटोळ्यावर उभा असून त्याने स्वतःच्या नाकाडावर मानवी रुपातील पृथ्वीला पेलले आहे. या तीन मूर्ती, त्याचप्रमाणे रामटेक येथील त्रिविक्रम, पवनार येथील बुद्ध व रुद्रनरसिंह मंदिरात सापडलेले महाकाय द्वारपाल या मूर्ती पूर्वेकडील वाकाटक कलेच्या उच्चतम अभिव्यक्ती आहेत. प्रस्तरलेखांच्या आणि कलात्मक पुराव्यावरुन या मूर्ती इ.स. व्या पाचव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थकातील आहेत असे म्हणता येईल.
यापुढील टप्यातील उत्कृष्ट नमुन्यांकरीता फार दूर जाण्याची आवश्यकता नाही. हमलापुरी आणि मन्सर येथे काही शिल्पाकृती सापडल्या असून त्या नाजुकता आणि परिपूर्णता दाखवितात. हमलापुरी येथील शेतात सापडलेल्या दोन गणांच्या मूर्ती याचे उत्तम उदाहरण आहेत. यापैकी कुंभोदर असलेली बसकी मूर्ती ही देवाच्या बागडणाऱ्या परिचरांची वास्तववादी शिल्पाकृती असून ती त्यांचे यथातथ्य प्रतिनिधित्व करते. एका गणाला जणू हर्षाच्या उकळ्या फुटत आहेत तर दुसरा राजासारखा ऐसपैस बसला आहे. मन्सरला सापडलेली मूर्ती शिवाच्या रौद्र-सौम्य (ambivalent) स्वरुपाची असून या प्रकारच्या देवमूर्तीमध्ये ती उत्कृष्ट आहे. राजेशाही थाटात (महाराज लीलासन) बसलेली देवाची ही ठेंगू आणि गुबगुबीत मूर्ती पूर्वेकडील वाकाटकांच्या सुबक कलेची द्योतक आहे. नाजुक कोरीवकाम, चेहऱ्याचे बारकावे, केसांच्या जटा, जटांमध्ये माळलेली आणि हातात धरलेली फुले ही त्याची उदाहरणे आहेत. या मूर्तीकरीता वालुकाश्म (fine grained sandstone) वापरल्यामुळे आकाराचा साधेपणा आणि तपशीलातील नाजूकपणा याचा मिलाफ प्रभावीपणे अभिव्यक्त झाला आहे. विनोबाजीच्या आश्रमाजवळील कथापरशिल्पपट आणि गंगा, पवनारच्या जवळील एक मंदिरात सापडलेला नारायणाचा शिल्पपट, वाशीम (जि. अकोला) येथील उमामहेश्वर आणि निधिपुरुषांच्या मूर्ती हे या टप्यातील आणखी काही नमुने आहेत. मगरीवर उभी असलेली प्रत्यक्षाकारापेक्षा किंचित छोटी गंगाभगवतीची मूर्ती या टप्यातील एक सुंदर कलाकृती आहे. ही मूर्ती अगदी कृपाळूपणे उभी असून तिच्या अंगावरील झिरझिरीत वस्त्रांना चुण्या दाखविल्या आहेत. अंगावर काही अलंकारही आहेत. गंगेची मूर्ती पवित्र स्त्रीत्वाच्या तुरीय अभिव्यक्तीमुळे नजरेत भरते तर कंसवधासारखे कथापरपट तालयुक्त आणि चातुर्यपूर्ण मांडणी व त्यात दाखविलेल्या व्यक्तिमत्वांपैकी विशेषतः श्रीकृष्ण व बलरामाच्या हालचालींमधील जोम व उत्साह इत्यादी बाबीमुळे उल्लेखनीय ठरले आहेत.
नगरधनच्या परिसरात (प्राचीन नंदीवर्धन) हमलापुरी येथे अगदी अलीकडेच सापडलेल्या ब्राँझमूर्तीमुळे दख्खनमधील ब्राँझशिल्पांबाबतच्या ज्ञानात भर पडली आहे. यापूर्वी केवळ फोफनार (जि. निमाड, मध्य प्रदेश) येथे सापडलेल्या ब्रॉझमूर्तीच वाकाटक कलेचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जात असे. फोफनार येथील ब्राँझमूर्ती बाघ येथे सापडलेल्या धार्मिक शिल्पाकृतींशी प्रचंड साधर्म्य दाखवितात. बाघ हे ठिकाण अजिंठा येथील शिल्प व रंगचित्रांच्याच परंपरेतील असून ते फोफनारपासून फारसे दूर नाही. काही विद्वान सकृतदर्शनी बाघ येथील कलेचा उगम वाकाटगक कलेत आहे असे मानतात. या ब्राँझमूर्तीमध्ये तीन उभ्या बुद्धमूर्तीचा समावेश होतो. यातील काही मूर्तीच्या प्रभावळी व अन्य भाग सुटे करता येतील असे आहेत. यातील मोठ्या शिल्पाकृतीचे उत्तर प्रदेशातील धनेसरखेडा येथील शिल्पाकृतीशी खूपच साधर्म्य असल्याने ती मथुरा कलाघराण्याच्या परंपरेतील असण्याची शक्यता आहे. उरलेल्या दोन्ही मूर्ती एतद्देशीय कलेचा नमुना आहेत. त्यापैकी एका शिल्पाकृतीला पदस्थल नाही. या उभ्या मूर्ती एकीकडे आंध्र प्रदेशातील बुद्धगयेतील प्रसिध्द बुद्धमूर्तीशी साधर्म्य दाखवितात तर दुसरीकडे अजिंठा येथील महाकाय बुद्धमूर्तीशी साम्य दाखवितात.
इ.स. च्या सहाव्या शतकातील शिल्प (अपरान्त) :-
राष्ट्रकूट शिल्प :-
इ.स. ११ ते १४ व्या शतकाच्या पूर्वकाळातील शिल्पे :
उत्तरचालुक्य शिल्प :
शिलाहार शिल्प :-

भारतीय मूर्तिविज्ञान एक संक्षिप्त आढावा ----
• प्रास्ताविक

• मूर्तिकलेची वाटचाल :-
मूर्तीचे प्रकार :-
मूर्तीलक्षणे -----
मूर्तिशास्त्रानुसार मूर्तीचे काही प्रकार -----

मूर्तीचे भंग :-
समभंग मुद्रास्थितीत मुर्ती बसलेल्या किंवा उभ्या अवस्थेत असली तरी शरीराचे संतुलन राखलेले असते. अर्थात या प्रकारच्या मुर्ती फारश्या आकर्षक वाटत नाहीत. बहुतेकदा ब्रम्हदेव, ऋषी, मुनींच्या मुर्ती समभंग स्थितीत केलेल्या असतात.
• आभंग :-
त्रिभंग स्थितीत मुर्तीच्या शरीराचे तीन भाग वेगवेगळ्या दिशेत वळालेले असतात. मान, कंबर आणि गुढगे अश्या रितीने वक्र दाखवलेले असतात कि मुर्तीमध्ये एक चेतना जाणवते. मस्तक डाव्या किंवा उजव्या बाजूस कललेले धड डाव्या किंवा उजव्या बाजूस वाकलेले अशा अवस्थेला त्रिभंग म्हणतात त्रिभंगामुळे मुर्तीला डौल येतो; पण अशा मूर्ती तुरळक असतात. बहुतेकदा अप्सरा किंवा सुरसुंदरीची शिल्प या त्रिभंग मुद्रेत घडवलेली असतात.
त्रिभंग मुद्रेतील मुर्ती
• अतिभंग :-यात त्रिभंगापेक्षा अधिक वक्रता असते वरचा भाग पुढे, मागे किंवा एका बाजूला बराच झुकलेला असतो. उग्र देवता, क्रोध देवता यांच्या मूर्ती या अवस्थेत असतात. नटराज शिव आणि इतर नृत्यमग्न मुर्ती याच मुदेर घडवलेल्या असतात. यामध्ये मुर्तीची मान, कंबर, मनगट, घोटा हे सर्व निरनिराळ्या बाजुला वक्र झालेले दाखवलेले असते. यामुळेच याला अतिभंग मुद्रा म्हणतात.
मूर्तीचे त्रिगुण :-
मूर्तिकलेतील आसने :-
मूर्तिकलेतील मुद्रा :-
मुर्तिकलेतील आयुधे :-
अलंकरणे :-
- हिंदू धर्म -
वैष्णव पंथ :-
वैष्णवपंथाचा आरंभ
वारकरी संप्रदाय :-
त्रिभंग म्हणजे तीन कोनांतून वळवलेले शरीर. शरीराला उठाव देण्यासाठी त्रिभंग मुद्रा शक्यतो वापरली जाते. शीर, धड आणि कंबर किंवा गुढघा.
ह्याच मुद्रांचे अबंग, समभंग, अतिभंग असेही प्रकार आहेत.
चित्र आंतरजालावरून.
भरतमुनींच्या अष्टनायिका पाहिल्या नाहीत कधी. पण हे सर्वच प्रकार खजुराहोतल्या मंदिरांवर मोठ्या नजाकतीने कोरलेले दिसतील.
बाकी मी लिहिलेल्या लेखांतील नावे ही मूर्तीशास्त्रातील तज्ज्ञांकदून माहित झालेली आहेत. पुस्तकांत बहुधा मी तरी वाचली नाहीत कुठे.
वरील
त्रिभंगाच्या इथे दिलेल्या चित्रातील सर्व आकृतींचे चेहरे, छाती आणि कंबर
समोरच्या बाजूनेच दिसते आहे (Front view) माझ्या माहितीप्रमाणे सबंध शरीर
उभा पीळ दिल्यासारखे तीन ठिकाणातून वळलेले असते, त्याला 'त्रिभंग' म्हणतात.
उदाहरणार्थ क्रमांक १० विषकन्या, आणि खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन
नायिका. शिल्पकलेच्या दृष्टीने अशी शिल्पे जास्त प्रगत होत. ही जास्त
सुंदर, रमणीय, कमनीय वाटतात.
उदाहरणार्थ
खालील शिल्पे: डावीकडील इजिप्शियन शिल्प ठोकळेबाज वाटते, तर उजवीकडील
ग्रीक शिल्प (आणि त्याखालील फ्रेंच शिल्प) त्यामानाने खूपच खर्यासारखे,
जिवंत वाटते.
..
.
.

Odalisque - Sculpture by French Artist James Pradier 1841
मी दिलेल्या चित्रातील शेवटची आकृती फक्त त्रिभंगाची. डावीकडून अभंग, समभंग, अतिभंग आणि शेवटी त्रिभंग असे प्रकार आहेत.
इजिप्शियन शिल्पे बरीचशी अभंग आणि समभंग यामध्ये मोडली जातात.
प्रतिमा विज्ञान में इसके बारे में विस्तृत जानकारी दी गई है। आप जिस मुद्रा के बारे में बात कर रहे हैं उसे 'अभंग मुद्रा' कहते हैं। इसमें शरीर…
- कूबड़ वाले बैल और भैंस की कांस्य आकृतियाँ इस अवधि के दौरान बनाई गई अन्य धातु की मूर्तियाँ हैं।
सिंधु घाटी सभ्यता की पत्थर की मूर्तियाँ
- सभ्यता के दौरान गढ़ी गई पत्थर की मूर्तियों के कई नमूने खुदाई में मिले हैं। इनमें से, दो मूर्तियाँ विशेष उल्लेख की पात्र हैं और इनमें ‘दाढ़ी वाले आदमी’ और ‘मानव धड़’ की मूर्ति शामिल हैं।
- यदि कोई व्यक्ति दाढ़ी वाले आदमी की आकृति को देखता है, तो उसे बाएं कंधे पर शॉल लपेटे हुए, अच्छी तरह से रखी दाढ़ी के साथ एक महायाजक या राजा का विचार प्राप्त होगा । मोहनजोदड़ो में पाया गया यह स्टीटाइट से बना था
- एक और प्रभावशाली पत्थर से गढ़ी गई मूर्ति नग्न मानव पुरुष धड़ की है, जो लाल पत्थर से बनी है । इस मूर्ति की भुजाएं और सिर अलग-अलग बनाए गए हैं। यह हड़प्पा में पाया गया था ।


सिंधु घाटी सभ्यता की टेराकोटा मूर्तिकला
- टेराकोटा कला का अभ्यास सिंधु घाटी के लोगों द्वारा भी किया जाता था।
- मोहन-जो-दारो में खोजी गई टेराकोटा से बनी देवी माँ की मूर्ति इस युग की महत्वपूर्ण टेराकोटा मूर्तियों में से एक है।
- इसमें शरीर की सुंदर अलंकरण और एक छिद्रित नाक शामिल है, और समृद्धि और उर्वरता के संकेत के रूप में देवी माँ की अवधारणा को प्रकट करती है।

- टेराकोटा मुहरों का भी निर्माण किया जाता था । इन मुहरों में पीपल के पत्तों की नक्काशी, देवी-देवताओं और जानवरों की आकृतियों वाली महिला मूर्तियाँ शामिल थीं।
- मोहनजोदड़ो से प्राप्त चलने योग्य सिर वाला खिलौना जानवर , उसी काल यानी 2500 ईसा पूर्व का है, जो खुदाई के दौरान मिली सबसे दिलचस्प वस्तुओं में से एक है।
- स्टीटाइट, टेराकोटा और तांबे से बनी विभिन्न आकृतियों और मापों की बड़ी संख्या में मुहरें भी खोजी गई हैं।
- मानक हड़प्पा सील 2×2 वर्ग इंच की एक चौकोर पट्टिका थी, जो आमतौर पर नरम नदी के पत्थर, स्टीटाइट से बनाई जाती थी।
- मुहरों पर विभिन्न प्रकार के रूपांकन अंकित हैं, जिनमें अधिकतर बैल, कूबड़ वाले या बिना कूबड़ वाले, हाथी, बाघ, बकरी आदि जानवर शामिल हैं । कभी-कभी पेड़ों या मानव आकृतियों का भी चित्रण किया जाता था। सबसे उल्लेखनीय मुहर वह है जिसके बीच में एक आकृति और चारों ओर जानवरों को दर्शाया गया है। इस सील की पहचान पशुपति सील के रूप में की जाती है। इस मुहर में एक मानव आकृति को पालथी मार कर बैठे हुए दर्शाया गया है । बैठी हुई आकृति के दाईं ओर एक हाथी और एक बाघ को दर्शाया गया है, जबकि बाईं ओर एक गैंडा और एक भैंस दिखाई देती है । इन जानवरों के अलावा सीट के नीचे दो मृग भी दिखाए गए हैं।
मोती और आभूषण
- हड़प्पा के पुरुष और महिलाएं कीमती धातुओं और रत्नों से लेकर हड्डी और पकी हुई मिट्टी तक हर कल्पनीय सामग्री से बने विभिन्न प्रकार के आभूषणों से खुद को सजाते थे।
- चन्हुदड़ो और लोथल में खोजी गई फैक्टरियों से पता चलता है कि मनका उद्योग अच्छी तरह विकसित हुआ है । मोती कॉर्नेलियन, एमेथिस्ट, जैस्पर, क्रिस्टल, क्वार्ट्ज, स्टीटाइट, फ़िरोज़ा, लापीस लाजुली, सांची में प्राचीन स्टॉर्म आदि से बने होते थे ।
- मोतियों के निर्माण के लिए तांबा, कांस्य और सोना जैसी धातुओं और सीप, फ़ाइनेस और टेराकोटा या पकी हुई मिट्टी का भी उपयोग किया जाता था । मोती अलग-अलग आकार के होते हैं- डिस्क के आकार के, बेलनाकार, गोलाकार, बैरल के आकार के और खंडित। कुछ मोती दो या दो से अधिक पत्थरों को एक साथ सीमेंट करके बनाए गए थे, कुछ सोने के आवरण वाले पत्थरों से बनाए गए थे। कुछ को काट-छाँट या चित्रकला करके सजाया गया था और कुछ पर डिज़ाइन खुदे हुए थे। इन मोतियों के निर्माण में महान तकनीकी कौशल का प्रदर्शन किया गया है।
- हड़प्पा के लोगों ने जानवरों, विशेषकर बंदरों और गिलहरियों के शानदार प्राकृतिक मॉडल भी बनाए, जिनका उपयोग पिन-हेड और मोतियों के रूप में किया जाता था।

मिट्टी के बर्तन:
- उत्खनन स्थलों पर पाए गए मिट्टी के बर्तनों को मोटे तौर पर दो प्रकारों में वर्गीकृत किया जा सकता है – सादे मिट्टी के बर्तन और चित्रित मिट्टी के बर्तन। चित्रित मिट्टी के बर्तनों को लाल और काले मिट्टी के बर्तनों के रूप में भी जाना जाता है क्योंकि इसमें पृष्ठभूमि को चित्रित करने के लिए लाल रंग का उपयोग किया जाता था और लाल पृष्ठभूमि पर डिजाइन और आकृतियाँ बनाने के लिए चमकदार काले रंग का उपयोग किया जाता था। पेड़, पक्षी, जानवरों की आकृतियाँ और ज्यामितीय पैटर्न चित्रों के आवर्ती विषय थे।
- जो मिट्टी के बर्तन पाए गए हैं उनमें से अधिकांश बहुत अच्छे पहिये से बने बर्तन हैं, जिनमें से बहुत कम हस्तनिर्मित हैं। पॉलीक्रोम मिट्टी के बर्तनों के कुछ उदाहरण भी पाए गए हैं, हालांकि बहुत दुर्लभ हैं। मिट्टी के बर्तनों का उपयोग तीन मुख्य उद्देश्यों के लिए किया जाता था:
- सादे मिट्टी के बर्तनों का उपयोग घरेलू उद्देश्यों के लिए किया जाता था , मुख्य रूप से अनाज और पानी के भंडारण के लिए।
- छोटे बर्तन, आम तौर पर आकार में आधे इंच से कम, सजावटी उद्देश्यों के लिए उपयोग किए जाते थे ।
- कुछ मिट्टी के बर्तन छिद्रित थे – नीचे एक बड़ा छेद और किनारों पर छोटे छेद थे। इनका उपयोग शराब छानने के लिए किया गया होगा।

मौर्य साम्राज्य की मूर्तियाँ
मौर्यकालीन मूर्तिकला ने भारतीय मूर्तिकला में नई चीजों की शुरुआत की जैसे लकड़ी की मूर्तियों के स्थान पर पत्थर और ईंट की मूर्तियों की शुरूआत । मौर्यकालीन अधिकांश मूर्तियाँ बौद्ध धर्म से संबंधित हैं । इसका श्रेय सम्राट अशोक को दिया जा सकता है। बौद्ध धर्म अपनाने के बाद सम्राट अशोक ने कई बौद्ध इमारतों और मूर्तियों का निर्माण कराया था। बलुआ पत्थर से बने खंभों और चट्टानों पर उकेरे गए अशोक के कुछ शिलालेख हमारे देश में सबसे पुरानी ज्ञात पत्थर की मूर्तियों का प्रतिनिधित्व करते हैं।
मौर्यकालीन मूर्तिकला पर विदेशी प्रभाव
- अशोक के शिलालेखों में अचमेनिड्स मॉडल के एक अनुकूलन को मान्यता दी गई है। लेकिन, मौर्य स्तंभ अचमेनिद स्तंभों से भिन्न हैं। मौर्यकालीन स्तंभ चट्टानों को काटकर बनाए गए स्तंभ हैं, जबकि अचमेनिद स्तंभों का निर्माण एक राजमिस्त्री द्वारा टुकड़ों में किया गया था।
मौर्य साम्राज्य की स्तूप मूर्तिकला
- ‘स्तूप’ ईंटों और पत्थरों से निर्मित ठोस गुंबद जैसी संरचनाएं हैं और इन्हें शुरू में मौर्य राजवंश में कलात्मक परंपरा के प्रतीक के रूप में बनाया गया था।
- मौर्य काल की वास्तुकला का सबसे बड़ा उदाहरण मध्य प्रदेश का महान सांची स्तूप है, जो चारों ओर उत्कृष्ट नक्काशीदार पत्थर की रेलिंग से घिरा हुआ है।
- यह तोरण नामक चार प्रवेश द्वारों के कारण भी प्रसिद्ध और उल्लेखनीय है , क्योंकि इससे पहले द्वारों पर नक्काशी की ऐसी कोई परंपरा नहीं थी। इन प्रवेश द्वारों पर विस्तृत नक्काशी की गई है और ये बुद्ध के जीवन के विभिन्न दृश्यों और उस युग के लोगों की जीवनशैली के बारे में भी दर्शाते हैं।

मौर्य साम्राज्य की स्तंभ मूर्तियाँ
- स्तंभ सम्राट अशोक द्वारा किये गये प्रमुख कार्यों में से एक थे ।
- सारनाथ में अशोक द्वारा बलुआ पत्थर से बनवाया गया सबसे प्रसिद्ध सिंह स्तंभ (चार सिंहों को दर्शाने वाला स्तंभ) वास्तविक रूप से भारतीय कलाकारों की कलात्मक उपलब्धियों और उनके गुरुओं के संरक्षण का प्रतिनिधित्व करता है।
- स्तंभों के निर्माण में दो प्रकार के पत्थरों का उपयोग किया गया था, जिसमें वाराणसी के निकट चुनार क्षेत्र के बारीक दाने वाले कठोर बलुआ पत्थर के साथ-साथ मथुरा के धब्बेदार सफेद और लाल बलुआ पत्थर शामिल थे।
- इन सभी स्तंभों पर ‘धम्म’ या धार्मिकता के सिद्धांतों वाले शिलालेख जड़े हुए थे । लौरिया नंदनगढ़ में शेर की राजधानी और रामपुरवा की बैल की राजधानी प्रभावशाली मूर्तिकला कला है जो मौर्य साम्राज्य के दौरान विकसित हुई थी।
मौर्य साम्राज्य की मूर्तियाँ
- दीदारगंज की मूंछधारी मूर्ति, बेसनगर की महिला ‘यक्षी’ मूर्ति और परखम में पुरुष मूर्ति मौर्य साम्राज्य की कुछ प्रसिद्ध मूर्तियाँ हैं।
- कारीगरों द्वारा कई टेराकोटा की मूर्तियाँ भी बनाई गई थीं और अहिच्छत्र में की गई कुछ खुदाई में मातृ देवियों की मिट्टी की मूर्तियाँ भी मिली हैं ।
- ओडिशा में भुवनेश्वर के पास धौली में हाथी की चट्टान को काटकर बनाई गई मूर्ति अशोक के शिलालेखों पर उकेरी गई हाथी के अग्र भाग का प्रतिनिधित्व करती है, जिसमें विशेष रूप से कलिंग के लिए बनाई गई दो मूर्तियां भी शामिल हैं।






.jpg)

























































.jpg)






















































































































































































.jpg)
.jpg)
.jpg)

















































.jpg)














































.jpg)

























No comments:
Post a Comment