Thursday, June 20, 2024

मुर्ती विज्ञान प्रस्तावना

भारतीय मूर्तिविज्ञान एक संक्षिप्त आढावा ----

• प्रास्ताविक

     भारतातील मूर्तिविज्ञान हे नेहमीच एक औत्सुक्याचा विषय बनून राहिले आहे. एखादी गोष्ट जवळ नसताना तिच्या विषयी प्रेमादर व्यक्त करण्यासाठी किंवा तिचे स्मारक करण्यासाठी म्हणून तिची प्रतिमा तयार करावयाची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. मानवाची ही अनुभूती व्यक्त करण्याची अभिव्यक्ती म्हणजेच कला होय आणि यातूनच मूर्तिकला उदयास आली असावी कारण ही कला केवळ भावनांचेच प्रदर्शन करते असे नाही, तर अध्यात्मिक संदेशही देते. म्हणूनच ही कला फारच व्यापक चिरंतन आहे, असे म्हणावे लागेल. आदिम जीवन संपले तरी कला जिवंत आहे. इतिहासाच्या विकासात कलेचा उदय कधी झाला हे सांगता येणे कठीण आहे.
    कलाकार हा मात्र सत्याचा उपासक आहे असे म्हणावे लागेल. पूर्वी प्राचीन काळी मानव हा संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत होता. त्या आदिम अवस्थेत त्याने देव नावाची वस्तू शोधून काढली. देवतांच्या ठिकाणी प्रचंड शक्ती आहे हे त्याने जाणले. याबरोबरच आणखीही काही शक्ती आहेत, त्या दानवी शक्तींचाही त्याला सुगावा लागला होता. आणि या दैवी व दानवी दोन्ही प्रकारच्या शक्ती विश्वात वास करतात हे त्याने जाणले. तसेच या निसर्गातील डोंगर, नद्या, तळी, वृक्ष, पशु, पक्षी, पाषाण, यातही या शक्तो वास करतात हे त्याला भावले. आणि मग तो या सर्वांचीच पूजा करू लागला. आपल्याभल्याबु-यासाठी त्यांची प्रार्थना करू लागला. संकटाच्या वेळी सर्वांना आळवू लागला. इथेच प्रतीकरुपाने केलेल्या पूजेस सुरुवात झाली.
     माणसाची बुध्दी जसजशी विकसीत होऊ लागली, तसतशा देव, दानव विषयक कल्पना त्याच्या मनात आकार घेऊ लागल्या. देवांचे पुसटसे दर्शन त्याच्या मनाला अंतःचक्षूना घडू लागले. मनात मानलेल्या देवाचे स्वरूप त्याच्या नजरेसमोर तरळू लागले. त्याने जो देव मानला तो त्याला भावला. अर्थातच तो मानवरुपातच होता. देव ही कल्पना त्याच्या मनापुढे साकारली. स्वतःच्या ठिकाणी असलेले हातापायातील सामर्थ्य त्याला माहित होते. देव म्हणजे श्रेष्ठ असे त्याला वाटले. आणि देवतांच्या बाबतीत हे सामर्थ्य त्याने अनंतपटीने वाढविले व त्या रुपातच देवाला पाहिले. पुढे त्याला वाटू लागले, या देवाची मूर्ती घडवावी. सुरुवातीला त्याने मानवी आकृतीचीच योजना केली. स्वतःला अनुकूल देवांच्या मूर्ती माणसाने सौम्य व सुंदर घडवल्या. त्यांच्या ठिकाणी असलेली अफाट शक्ती दर्शविण्यासाठी त्याने मूर्तीला दोनाच्या ऐवजी चार हात लावले. कधी जास्त बळ दर्शविण्यासाठी त्यापेक्षाही अधिक हाताची योजना केली. कोणाला तीन डोळे, तर काहींना दोन तोंडे कधी कधी तर चार सहा दहा अशीही तोंडांची संख्या बनत गेली. अशा देवांची पूजा तो आपल्या कल्याणासाठी मनोभावे करु लागला. देवांच्या मूर्ती सौम्य व अल्हाददायक बनविल्या, तर याच्या उलट दानवांच्या मूर्ती भयानक स्वरुपाच्या बनविल्या. माणूस मूलतः हुषारच. देवांची पूजा तो स्वतःच्या कल्याणासाठी करीत असेच. परन्तु या दानवांचीही पूजा तो त्यांनी आपल्यावर संकटे आणू नयेत म्हणून करु लागला.
       इ.सन पूर्व २५०० वर्षापूर्वीचा काळ सर्वात प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. हा सिंधू संस्कृतीचा काल मानतात. सिंधू नदीच्या परीसरात एका प्रगत अशा संस्कृतीची वाढ झालेली असल्यामुळे विद्वान लोक तिला सिंधू संस्कृती म्हणून ओळखतात. सिंध पंजाब प्रदेशात झालेल्या उत्खननात मातीच्या विपूल मूर्ती मिळाल्या. मातृदेवता, शिवदेवता, शिक्क्यावरील पशुपती या मूर्तीवरुन सिंधू संस्कृतीतील लोक मूर्तिपूजा करीत असावेत असे अनुमान संशोधिकेने केले आहे. दक्षिण भारतात जे द्रविड लोक वसलेले आहेत ते मूळचे सिंधू संस्कृतीतील असावेत व त्यांनीच मूर्तिपूजा सुरू केली असावी. कारण पूजा व भक्ती ही द्रविडांची होती व ती आजही आहेत."
     यानंतरचा कालखंड म्हणजे वैदिक काळ वैदिक आर्यांची संस्कृती यज्ञप्रधान होती. त्यांनीही काही देव कल्पिलेले होते. देवतांना द्यावयाचे पदार्थ ते अग्निद्वारे समर्पण करीत असत. अग्निद्वारे ते पदार्थ त्या देवतांपर्यंत पोहोचतात ही त्यांच्या मनातील दृढ श्रद्धा होती. इन्द्र, वरुण, आदित्य अशा देवतांची पूजा चाले असे असले तरी वैदिक आर्य मूर्तिपूजक होते कि नाही यात संदेह आहे परंतु वेदांतील अनेक ऋचामध्ये देवतांच्या मानवी आकृर्तीचे वर्णन केले आहे. यावरून वैदिक लोक मूर्ती बनवीत असावेत असे अनुमान निघते. वेदांमध्ये मानवी रूपांचे वर्णन असले तरी वैदिक आर्य त्या मूर्तीची पूजा करीत होते, असे सांगणारी वचने मुळीच सापडत नाहीत. म्हणजे प्राचीन काळी वैदिक धर्मात मूर्तिपूजा नव्हती असे मान्य करण्यास हरकत नाही.
      वेदानंतर ब्राम्हणे, आरण्यके निर्माण झाली, त्यानंतर उपनिषदे, भारतात भक्तीधारा प्रवर्तिन करण्याचे श्रेयही उपनिषदांना आहे उपनिषद काळात परब्रह्माची कल्पना रूढ झ गाली परब्रह्माचे निदिध्यासन हेच ईश्वराचे पूजेचे स्वरूप ठरले. या काळात नैसर्गिक वस्तुंचीच पूजा होत असे. देवावर मनुष्यत्वाचा आरोप करणे हा मनुष्याचा स्वभावगुणधर्म आहे. त्यामुळे वेळोवेळी देवतांच्या स्तुतिमध्ये मानवी वर्णने आढळतात. देवतांस मानवी रूपे आहेत; देवतांस कोणतेही रूप नसते, त्या निर्गुण, निराकार असतात किंवा त्या दोन्ही स्वरुपाच्या असतात अशी मते मांडली जाऊ लागली."
    मूर्तिपूजा हे हिंदू धर्माचे महत्वाचे अंग मानले जाऊ लागले भारतात मूर्तिपूजा इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे की, अशा प्रकारची पूजा इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. याला पौराणिक परंपरा आहेत. पौराणिकधर्म पूर्णपणे प्रस्थपित झाल्यावर मूर्तिपूजेलाही बहर आला.
      प्राचीन काळी भारतात कला आणि धर्म हातात हात घालून मार्गक्रमित असत. निरनिराळ्या देवतांची शिल्पे डोळे दिपवितात. तर काही देवतांच्या मूर्ती आपल्या सौंदर्याने थक्क करतात याचे कारण ती कसबी लोकांची कला नव्हती, तर भक्तीने भारलेल्या भाविकांची ती देवाच्या चरणी रुजू केलेली सेवा होती. म्हणून त्या कलेच्या मांडणीत आपले नाव कोरून ठेवावे असे त्यांना वाटले नाही. त्या कलाकृती निर्माण प्रसंगी ते जणू कलानिधी ईश्वराशी तद्रुप झाले होते भारतीय कलेचे हे एक वैशिष्ट्यच मानावे लागेल. - भारतीय संस्कृतीकोष.
    भारतीय मूर्तीशास्त्राचा विकास हळूहळू होत गेला. शास्त्रीय दृष्टिकोनातून मूर्तिशास्त्राला विशेष महत्व आहे सुंदर कलाकृतींनी भारतीय मनाची पकड घेतली; याचे कारण फक्त कलेबद्दलचे प्रेम नसून ती या देशाची अध्यात्मिक परंपरा आहे. भारतीय विचारवंताचे मन केवळ बाह्य सौंदर्यावर भुलले नसून ते आंतरिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यास आसुसलेले असते. ते दगड माती वगैरे माध्यमाची पूजा करीत नसून त्यामध्ये प्रतिष्ठित केलेल्या अनाकलनीय शक्तीची उपासना करीत असते. भारतीय विचारधारेप्रमाणे उपसनेचे लक्ष्य निर्गुण परब्रम्हाशी असते निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना ही सगुण साकार देवाच्या उपासनेपेक्षा श्रेष्ठ मानली आहे. मूर्तीपूजेच्या इतिहासाचा दुसरा टप्पा म्हणजे सुरुवातीच्या काळात तांब्याच्या व काहीशा मानवाकार वस्तु होत वैदिक युगातील मूर्तिपूजेच्या आस्तित्वाबद्दल मतभिन्नता आहे. मूर्तिपूजेच्या प्राचीनतेचा विचार करीत असताना वेदकालापर्यंत पाहिले तर त्यानंतरच प्रतिमापूजनाचे बरेच उल्लेख मिळू लागतात. कुषाणकालात मूर्तिविज्ञानाचा चांगलाच विस्तार होऊ लागला. मूर्तिविज्ञानाचा पाया येथूनच पुढे स्पष्टपणे वर येताना दिसतो. मूर्ती घडविण्यासंबंधी निरनिराळे प्रयोग येथूनच पुढे सुरू झाले. आणि वाङमय व कला या दोन्ही क्षेत्रात वाढीस लागले.

• मूर्तिकलेची वाटचाल :-

     भारतात मूर्तिकला फार प्राचीन काळापासून आढळते. मूर्तिकलेचा उगम शोधायचा म्हटले तर वेदकाळाच्याही मागे जावे लागते. मूर्तिकलेच्या विविध अंगांची माहिती आणि नियम अनेक पुराणात दिले आहेत त्यादृष्टीने मत्स्य, अग्नी, पद्म आणि विष्णुधर्मोत्तर ही पुराणे महत्वाची आहेत. त्यात प्रतिमालक्षण, प्रतिमेची प्रतिष्ठा, देवगृहनिर्माण इ. विषयांचे विवरण केलेले आहे. देवतांच्या मूर्ती बनविणे, त्यांची प्राणप्रतिष्ठा इ.चे नियम दिले आहेत. मूर्तीशास्त्रात मूर्तीचे विविध प्रकार कल्पिलेले आहेत. त्यात काष्ठ, माती, धातू, पाषाण ई. चा समावेश होतो .

मूर्तीचे प्रकार :-

• काष्ठमूर्ती :- मूर्ती बनविण्यासाठी देवदार, चंदन, शमी, मधुक, अश्वत्थ, खैर, बेल, जीवक, सिन्धुक, केशर, अम्र, शाल, मंदार या वृक्षाचे लाकूड योग्य असते.प्रारंभी मूर्ती या लाकडाच्याच बनवीत असत. ज्या प्रकारची लाकडाची मूर्ती बनवायची ते लाकूड लगेच उपलब्ध नसे. मग योग्य वृक्ष निवडायचा, तो तोडून घरी आणायचा. नंतर कालांतराने या मूर्ती घडविल्या जात. या मूर्ती बनविताना वापरायचे लाकूड चरे पडलेले नसावे. भंगलेले नसावे. गाठाळलेले, किडलेले नसावे तर ते सुंदर व मजबूत असावे. उदा. जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ (कृष्ण) बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती या काष्ठमूर्ती आहेत.
• मातीच्या मूर्ती :- मूर्तिकलेचा इतिहास हा फार प्राचीन आहे. मृण्मयी मूर्तीचा शोध घेण्यासाठी वैदिक काल ओलांडून त्याच्याही पलिकडे इ. सना पूर्वी २५०० वर्षांमागे जावे लागते. कारण प्रथमतः मृण्मयी मूर्तीचा शोध तेव्हाच लागलेला आहे. सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून मृण्मयी मूर्ती बनविल्या जात असल्या आणि थेट आजपर्यंत त्या बनविल्या जात असल्या तरी ज्यामध्ये कलेचा अंश सापडतो अशा मूर्ती फारच कमी आहेत. मृण्मयी मूर्ती बनविण्यासाठी नदीच्या काठची माती आणावी. तिच्यात समभाग दगडाचे चूर्ण, वाळू, व लोहचूर्ण मिसळावे. काही तुरट पदार्थ काही लाकडाचे अर्क, दही, दूध व तूप हे पदार्थ त्या मातीत एकजीव करावे तो सर्व लगदा महिनाभर तसाच ठेवावा व नंतर त्याची मूर्ती बनवावी असे वर्णन हयशीर्षपंचरात्र या ग्रंथात दिले आहे. नैमित्तिक व्रतासाठी अशा नूर्ती बनवितात व व्रत संपल्यानंतर त्याचे विसर्जन करीत." मातीच्या मूर्तीचे दोन प्रकार असत. एक पक्व म्हणजे पूर्ण भाजलेली (चिरंजीव) व एक अपक्व म्हणजे कच्ची (तात्कालिक) पक्व मूर्ती श्रेष्ठ असल्यातरी विसर्जनासाठी अपक्व मूर्ती चांगल्या असतात. उदा. गणपती, हरितालिका इ.
     धातूमूर्ती - ही कला भारतीयांना प्राचीन काळापासून अवगत होती असे म्हणावे लागेल . धातुच्या मूर्ती या ओतीव असत. कांसे या धातुच्या लहान मूर्ती ओतण्या चे विधान मधुच्छिष्ट विधान या नावाने ओळखले जात होते." मधुच्छिष्ट म्हणजे मेण. कलाकार प्रथम मेणाची प्रतिमा बनवून तिच्यावर मातीचे तीन थर थापीत. माती नीट सुकली की मेणाला आच देऊन वितळवीत त्यामुळे मूर्तीचा साचा तयार होई नंतर त्या साच्यात धातूचा रस ओतीत. रस थंड होऊन मूर्ती बनली की तो साचा फोडीत. आतली मूर्ती नंतर घासून पुसून साफ करीत. धातुच्या मोठ्या मूर्ती बनविणे मात्र कष्टाचे असते. गुप्तकाळपर्यंत कलाकार. अशा मूर्ती बनवीत. गुप्तकाळातील बुद्धमूर्ती व नंतरच्या काळातील मंजुश्रीची मूर्ती हि दोन उदाहरणे आहेत. भारतीय मूर्ती संभारात पंचलोह, तांबे, पितळ, चांदी, सोने यांच्या मूर्ती विपुल प्रमाणात सापडतात. घरातील पूजेच्या मूर्ती प्रामुख्याने धातुच्याच असतात. चोलांच्या काळात कास्यमूर्तीना विशेष बहर आला होता.
• पाषाणमूर्ती - बहुतेक देवस्थानात प्राणप्रतिष्ठा करुन कायमच्या बसविलेल्या मूर्ती मुख्यतः पाषाणाच्याच असतात अशा मूर्ती कशा घडवाव्यात याचे तंत्र अनेक ग्रंथातून सांगितले आहे चांगला पाषाण कोणता ते ओळखून त्याची अंतरंगपरीक्षा कशी करावी ? भूस्तर शास्त्रानुसार पाषाणाचे बाल, युवा, मध्य वृध्द इ. प्रकार कसे ओळखावे हे कळते. पाषाणमूती घडविण्यासाठी छिन्नी व हातोडीचा उपयोग करतात. मौर्य काळापासून अशा पाषाणमूर्ती घडू लागल्या. या काळात आठ ते दहा हात उंचीच्या पाषाणमूर्ती आढळल्या. परखम नावाचा यक्ष इ.स.पूर्व सातव्या शतकातला असून भारतीय मूर्तिशिल्पात हा पुतळा सर्वात प्राचीन मानला जातो.
    वेदकालानंतर सुमारे दोन हजर वर्षाच्या काळातल्या मूर्ती उपलब्ध होत नाहीत नाहीत. मौर्यकाळाच्या प्रारंभाला महाजनपदयुग म्हणतात. कुषाण कालीन गांधार शैलीतील मूर्तीवर देशी विदेशी छाप दिसते; पण मथुरा शैलीतील कला शुध्द भारतीय दिसते तर शुग युगातल्या मूर्ती पोषाखावरुन ओळखता येतात. या काळात माती व पाषाण दोन्हीही मूर्ती घडू लागल्या. गुप्त काळात भारतीय कलेचा परमोत्कर्ष झालाआणि भारतात मूर्ती व कला सर्वांगानी बहरल्या.

मूर्तीलक्षणे -----

     मूर्तीकलेच्या आरंभी तिचे निय्म किंवा शास्त्र निर्माण झाले नव्हते. एखादी मूर्ती कलाकाराच्या अंतरात जशी स्फुरेल तशी तो घडवायचा. पण पुढे दैवत संप्रदाय वाढीस लागले. देवतेसंबंधी ब-याच गोष्टी निश्चित झाल्या मग पुढे मूर्तिकारांना तो सर्व तपशिल लक्षात घेऊन मूर्ती घडवाव्या लागत. या सर्व तपशिलाच्या प्रकारांनाच मूर्तिकलेची परिभाषा म्हणतात.

मूर्तिशास्त्रानुसार मूर्तीचे काही प्रकार -----

• चल - या प्रकारातील मूर्ती लहान व हलक्या असतात. म्हणून त्या धातूच्या बनविलेल्या असतात. त्यांना उत्सवमूर्ती म्हणतात मिरवणूक किंवा धार्मिक कृत्ये यासाठी या मूर्ती उपयोगात आणतात .
• अचल - या प्रकारातील मूर्ती प्रामुख्याने पाषाणाच्या असून त्यांची देवळात कायमची प्रतिष्ठा करतात .
• चलाचल या प्रकारातील मूर्ती काही काळ चल तर काही काळ अचल असतात उदा. तुळजापूरची भवानी मूर्ती. या मूर्तीचा वर्षातून काही शयनकाल ठरलेला आहे. या काळात ती मूर्ती उचलून शेजघरात पलंगावर झोपवितात .
• चित्र - या प्रकारात मूर्ती मागून पुढून कोरलेली व सगळे अवयव व्यवस्थित दाखविणारी असते .
• अर्धचित्र - या प्रकारात मूर्ती पाठशिळेवर उठावात कोरलेली असते .
• चित्रार्ध या प्रकारात भिंतीत, दगडात, छतावर, खांबावर, गोपूरावर या मूर्तीचा दर्शनीय भागच दिसतो.
• चित्राभास - या प्रकारात मूर्ती कापडावर रंगविलेली असते."

मूर्तीचे भंग :-

उभ्या मूर्ती ज्या चार भिन्न अवस्थेमध्ये बनविलेल्या असतात त्या अवस्थांना मूर्तीशास्त्राच्या पारिभाषिक शब्दात भंग असे म्हणतात. मूर्तीचे सौंदर्य तिच्या भंगात असते.
• समभंग - दोन्ही पायावर सारखा भार देऊन शरीर कुठेही न वाकविता ताठ उभे राहणे आणि त्या वेळी दृष्टी समोर असणे याला समभंग असे म्हणतात.
• आभंग शरीराचा वरचा व खालचा भाग या अवस्थेत किंचित वक्र असतो .टाळूपासून निघालेली लंबरेषा नाभीच्या किंचित उजव्या बाजूने जाते.
• त्रिभंग मस्तक डाव्या किंवा उजव्या बाजूस कललेले धड डाव्या किंवा उजव्या बाजूस वाकलेले अशा अवस्थेला त्रिभंग म्हणतात त्रिभंगामुळे मुर्तीला डौल येतो; पण अशा मूर्ती तुरळक असतात.
• अतिभंग यात त्रिभंगापेक्षा अधिक वक्रता असते वरचा भाग पुढे, मागे किंवा एका बाजूला बराच झुकलेला असतो. उग्र देवता, क्रोध देवता यांच्या मूर्ती या अवस्थेत असतात. 

मूर्तीचे त्रिगुण :-

• सात्विक - उदा. योगरूढ स्थितीत विष्णू, विट्ठल, व्यंकटेश.
• राजस उदा. नटराज.
• तामस उदा. नरसिंह, काली, चामुंडा.

मूर्तिकलेतील आसने :-

     मुर्तीच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे यथार्थ दर्शन होण्यासाठी तिची बैठक विशिष्ठपणे ठेवणे म्हणजे आसन होय. मूर्ती घडविताना तिच्या पायांची विशिष्ठ ठेवण मनात ठरवून, तशा प्रकारची घडण करून ती बसविलेली दाखवणे म्हणजे तिचे आसन होय. यामधून त्यादेवतेची अवस्था मानवाच्या अवस्थेहून भिन्न आहे हे सूचित करावयाचे असते. आसने ही मूर्तीचे भाव आणि दैवी गुण प्रकट करतात.
• अर्धपर्यंक पद्मासन घालून व एक मांडी कोणतेतरी उशीसारखे आसन देऊन थोडी वर उचलणे.
• आलीढ डावा पाय गुढघ्यात वाकवून पुढे घ्यावयाचा आणि उजवा पाय ताठ पण तिरका मागे ठेवायचा.
• उत्कटित पाय सरळ उभे ठेवून किंवा त्याना तिढा घालून उकिडवे बसणे.
• कूर्म - दोन्ही पायाच्या टाचा मागे चिकटलेल्या रहतील अशा प्रकारे मांडी घालणे.
• पद्म - दोन्ही पायांच्या टाचा उलट बाजूला जांघात बसतील अशा प्रकारे मांडी घालणे
• पर्यक साधी मांडी घालून बसणे.
• प्रत्यालीढ आलीढच्या उलटे करणे.
भद्र - दोन्ही पाय लोंबते सोडून उंच पीठावर बसणे.
• योग - पद्मसनामध्ये ध्यान मुद्रा लावणे.
• ललित - उंच जागी एका पायाची मांडी घालून दुसरा पाय लोंबता खाली सोडणे.
• वज्र - पायांचे तळवे उलट बाजूच्या मांड्यावर येतील असे करून तळहात गुडघ्यावर पालथे ठेवणे.
सुख - शरीराला आराम वाटेल अशा प्रकारे बसणे.
• स्वस्तिक पायाची बोटे उलट बाजूच्या गुडघ्याच्या बेचक्यात बसतील अशी मांडी घालणे.
• प्रलंबपादासन - दोन्ही पाय खाली सोडून उंच पीठावर बसणे.
• सोपाश्रय सैलसर मांडी घालून तळपायाची तिढी पुढे ठेवलेल्या कोणत्यातरी आधारावर बसविणे.१७

मूर्तिकलेतील मुद्रा :-

हाता    चा तळवा व बोटे अनेक भिन्न प्रकारच्या अवस्था दर्शवू शकतात. या अवस्थांना मुर्तिकलेच्या परिभाषेत मुद्रा असे म्हाणतात ज्या अवस्थेत दंडापासुन संपूर्ण हाताचा उपयोग केलेला असतो तिला हस्त असे म्हणतात. हस्तही मुद्रांच्याच प्रकारात येतात. मुद्रा किंवा हस्त भिन्न भिन्न दाखवून त्या त्या देवतेच्या भिन्न भिन्न कृर्तीचा बोध करून देणे हे भारतीय मूर्तीशिल्पाचे वैशिष्ट्य आहे.
• अंजली दोन्ही हातांचे तळवे एकमेकाना जोडून डाव्या हाताच्या बोटावर उजव्या हाताची बोटे व डाव्या हाताच्या अंगठ्यावर उजव्या हाताचा अंगठा टेकविणे. दोन्ही तळव्यात थोडा फुगवटा ठेवून मनगटापासून पुढील हात जमिनीशी समांतर ठेवणे.तिला नमस्कार मुद्रा असेही म्हणतात.
अभय हाताचा तळवा समोरच्या व्यक्तीकडे वळवून कोपरापासून पुढचा हात उभा धरणे, बोटे ताठ ठेवणे. या मुद्रेने मनाची निर्भयता, सुरक्षितता व स्वस्थता हे भाव प्रकट होतात .
• कटकसिंहकर्ण- चारही बोटांची टोके अंगठ्याच्या टोकाला मिळवून कडे तयार करणे.
• कट्यवलंबित कमरेवर हात ठेवणे.
• कर्णसिंहमुख - तर्जनी व करंगळी सरळ ठेवून मध्यमा व अनामिका तळहातावर दाबून हात लांब करणे.
• कर्तरिहस्त - तळहात जुळवून व विमुख करून खांद्याच्या रेषेत आणणे.
• अर्धचंद्रहस्त- अंगठा व तर्जनी दूर पसरून अर्धचंद्राकृती बनविणे.
• तर्जनी तर्जनी उभी करून बाकीच्या बोटांची मूठ दाबणे .
• तर्पण - दोन्ही हातांची ओंजळ खांद्याच्या पातळीत आणणे .
• धर्मचक्र - उजव्या हाताने ज्ञानमुद्रा व डाव्या हाताने व्याख्यान मुद्रा केली असता ही मुद्रा होते.
ध्यान किंवा समाधी पद्मासनात ताठ बसून दोन्ही तळहात मांडीवर उताणे ठेवून डोळे मिटणे.
नमस्कार - दोन्ही हात जोडून जमोनीशी लंबरूपात धरणे.
• भूस्पर्श डव्या हाताचा तळवा वर करून तो मांडीवर ठेवणे उजवा हात गुडघ्याखाली अणून तो जमिनीवर टेकविणे.
• वरद- उजवा हात पालथा करुन व बोटे परस्परांस जुळवून तो खाली वळविणे.
• व्याख्यान उजव्या हाताचा अंगठा तर्जनी यांचे कडे करून बाकीची बोटे सुटी ठेवणे. तळहात पाहणारा समोर धरणे.
• ज्ञान अंगठा व तर्जनी यांची अग्रे जुळवून आणि बाकीची बोटे मोकळी सोडून तळहात हृदयाशी धरणे. 

मुर्तिकलेतील आयुधे :-

   देवतांच्या मानवाकृतीत आयुधांचा संयोग दाखविलेला आहे हा संयोग प्रतीकरूपाने कल्पित आहे. माणसाला आपली जीवनगाथा चालविणे आणि शत्रूपासून संरक्षण करणे यांसाठी जशी गरज असते तशी ती देवतांनाही असते देवताही आपली विशिष्ट आयुधे घेऊन दैत्य दानवांशी युद्ध करतात. पुष्कळदा आयुधांवरून मूर्तीची ओळख पटते.
  • शंख प्राचीन काळी रणक्षेत्रावर वीरांना स्फुरण देण्यासाठी शंख वाजविण्याची प्रथा होती. मूर्तिकलेत शंख हे ज्ञानाचे प्रतीक मानले आहे. वामावर्त आणि दक्षिणावर्त असे दोन प्रकार आहेत. आयुधमूर्तीत शंखाची पुरुषमुर्ती दिसते. त्याचा उजवा हात व्याख्यान मुद्रा दर्शवित असून डावा हात कमलधारी आहे. वैष्णव संप्रदायात शंखाला विशेष महत्व आहे.
■ चक्र हे वैष्णव आयुध आहे ते पूर्णतेचे प्रतिक आहे. चक्राचीही मूर्ती घडविली गेली आहे. सुदर्शन चक्राच्या परीघाला चिकटून त्याची मूर्ती बनवितात.
• गदा हे प्राचीन आयुध आहे. वैदिक आर्य गदा वापरीत होते गदा आयुधदेवीच्या रूपात दाखवितात.
खड्ग लांब किंवा आखुड तलवार य रूपांना मुर्तिकलेमध्ये खड्ग म्हटले आहे. बहुतेक बहुभुज मूर्ती खड्गधारी असतात.
धनुष्य - बाण - हे अतिप्राचीन आयुध आहे. वेदकाळपूर्वीही भारतात त्याचा वापर होता. शिंगाचे व वेळुचे असे त्याचे प्रकार आहेत.
• खट्वांग हा गदेचाच एक प्रकार आहे चौपाइच्या खुरासारखा दांडा असून त्याच्या एका टोकावर माणसाची कवटी, असे त्यचे स्वरुप असते.
• अग्नी हे युद्धप्रतीक आहे.
• पाश फाससदृष्य आयुध
• वज्र इंद्राचे मधे मूठ व दोन्ही बाजूंस त्रिशूल असलेले आयुध.
• शूल शक्ती भाल्याचे प्रकार. १९ याशिवाय इतरही अनेक आयुधांचे प्रकार आढळतात.

अलंकरणे :-

मध्ययुगात मूर्तीला नखशिखांत अलंकृत करण्याची प्रथा सुरू झाली मूर्ती अलंकरणाने नटलेल्या दिसू लागल्या.
मुकुट - हे शिरोभूषण आहे याचे जटा मुकुट, किरिट मुकुट, करंड मुकुट असे तीन प्रकार पडतात.
• कर्णभूषणे यानाच कुंडलेही म्हणतात मकर कुंडल, रत्नकुंडल असे प्रकार पडतात .
• कंठभूषणे - यामध्ये हार, ग्रैवेयक, कौस्तुभ, वैजयंतीमाला, या आभूषणांचा समावेश होतो .
• बाहुभूषणे - यामध्ये कंकण, केयूर, अंगद अशी आभूषणे यात येतात.
• उदरबंध पोटावर बांधावयाचे बंधन.
• कमरबंध कमरेला बांधवयाचे बंधन.
• मेखला - कमरेला बांधावयाच्या साखळ्या.
• एकावली मोत्यांचा किंवा मण्यांचा एकपदरी सर .
कटक मनगटात घालावयाचे कंकण.
• गळसरी गळ्यात घालावयाची मण्यांची माळ .
• तांटकचक्र - वर्तुळाकार ताटलीच्या स्वरूपातील कर्णभूषण.
• फलकहार - फळाफुलांचा हार
• यज्ञोपवीत जानवे, वैकक्षक.
• श्रीवत्सचिन्ह छातीवर धारण केलेले त्रिशूल चिन्ह किंवा चौकोनी चिन्ह.
 अक्षमाला रुद्राक्षांची माला.
नुपूर - पायातील घुंगरु.
• तोडे हात व पायात घालावयाचे आभूषण .
 • अंगुलियक पायातील जोडवे पादमुद्रिका.

- हिंदू धर्म -

    मानव हा सहवास प्रिय प्राणी आहे. समुहाने राहणे त्याला आवडते अगदी अश्मयुगाच्या काळातही जेव्हा तो अन्न मिळविण्यासाठी भटक्याण्याच्या स्थितीमध्ये होता तेव्हाही तो टोळयांनी राहत असे. त्या अस्थिर जीवनकडून त्याने केलेली ही स्थिर जीवनाची वाटचाल आहे. याचा आढावा घेतला तर या वाटचालीला एक परंपरा आहे. सातत्य हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय आहे." मानव समुहाने व्यक्तीशः, संघषः स्वतःवर व समाजावर जे संस्कार केलेले असतात, जे विशिष्ट वळण लावून घेतलेले असतात त्यालाच संस्कृती म्हणतात ".
    परंपरप्रियता हा हिंदू धर्मीयांच्या स्वभावातील अनन्य साधारण घटक आहे. या परंपराप्रियतेला विकासाचा क्रम मानवत नाही असे नाही. परंपरेशी ज्यांचा धागा जुळतो अशा नवीन विचारसरणी समाजाने वेळोवेळी स्विकारले आहे. " अंतःसृष्टी व बाहय सृष्टी यातील ज्या ज्या गोष्टीवर मानवाने आपल्या मानव्याची संस्कार मुद्रा ठोकली आहे. त्या सर्व गोष्टींचा कलाप म्हणजे त्याची संस्कृती. ""
भारतीय संस्कृतीचा अविष्कार घडविणाऱ्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे धर्म व नितीमत्ता हिंन्दू धर्म हा भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आधार स्तंभ आहे. भारतात प्राचीन काळापासून जे निरनिराळे धर्म आणि पंथ अस्तित्वात आले, त्यांच्यात विशेष भेद नसून ते सर्व सत्याच्या अंतिम साक्षात्काराकडे नेणारे निरनिराळे मार्ग आहेत असे दिसून येते. शिव, विष्णू आदी देवांची मंदिरे भारतात कोठेही गेले तरी आढळून येतात. सर्वच हिंन्दू गाईला पवित्र मानतात. आत्म्याचे अमरत्व पुनर्जन्म, मोक्ष, निर्वाण, कर्म या सर्व कल्पना भारतातल्या बहुतांश धर्मात आढळून येतात. भारतात त्या सर्व धर्माच्या मुळाशी असणारा प्रवाह भारतातील धर्माची एकात्मता टिकवून ठेवतो असे दिसून येते भारतात राहणाऱ्या विविध जमातीमध्ये जी संस्कृती आणि सभ्यता आलेली आहे. ती जगाच्या सर्व संस्कृतीमध्ये वैशिष्टयपूर्ण ठरली आहे. भारतातल्या निरनिराळया सामाजिक आणि धार्मिक चालीरिती यातून सांस्कृतिक एकात्मताच दिसून येते.
      प्राचीन भारतीय परंपरेत धर्म ही संज्ञा विशिष्ठ अर्थाने वापरली जाते. संस्कृत मधील 'धृ' या मुळ धातूपासून धर्म ही संज्ञा बनलेली आहे. 'धृ' म्हणजे धारण करणे. या धातुपासून धर्म हा शब्द बनला आहे. समाजाची धारणा करणारा तो धर्म असा या संज्ञेला अर्थ आहे. ऋग्वेदात आधार देणे, पालनपोषण करणे, आचार या अर्थाने धर्म ही संज्ञा वापरलेली आहे. समाजाचे व्यवस्थितपणे नियमन करण्यासाठी तसेच समाजाला योग्य अशा आदर्श मार्गाने मार्गदर्शन करण्यासाठी प्रचलीत असलेल्या नियमांना धर्म ही संज्ञा दिली आहे. मानवाच्या जोवनाचे तसेच मानव समुहातून बनणाऱ्या समाजाचे नियमन करण्याचे काम धर्म करतो. धर्म या संज्ञेत कोणत्याही आचारांचा किंवा धार्मिक विधींचा समावेश असत नाही. ही मूलभूत स्वरुपाच्या तत्वांवर आधारलेली संकल्पना आहे. ही मूलभूत स्वरुपाच्या तत्वांवर आधारलेली संकल्पना आहे. नैतिक नियमांचे पालन करण्याच्या हेतून तसेच मानवी जीवनातील अंतिम उदिष्ट साध्य करण्यासाठी या तत्वात काही आचारांची विधींची जोड दिलेली आहे. मात्र आचार किंवा विधी हे धर्म संकल्पनेचे बाहयांग असून मूळ नैतिक तत्वांचाच धर्म संज्ञेच्या अंतर्भागात समावेश होतो. धर्मांची संकल्पना ही कोणत्याही काळात किंवा कोणत्याही देशात साचेबंद असत नाही या उलट काळाच्या गतीनुसार या संकल्पनेतही प्रगमनशिलता निर्माण होते. या प्रगमन शिलतेच्या वैशिष्ठयामुळेच कोणत्याही कालखंडात बदलत्या सामाजिक स्थितीतही समाजाचे यथार्थ मार्गदर्शन करण्याचे काम धर्म करतो, म्हणूनच निरनिराळया कालखंडात धर्म या संकल्पनेच्या द्वारे समाजाची धारणा केली जात असून धर्माच्या विचारावर समाजात गतिशिलता निर्माण केली जाते.
     प्राचीन भारतात इतर कोणत्याही देशापेक्षा दीर्घकालीन धार्मिक आक्रमणे झालेली असतानाही संस्कृतीचे सातत्य खंडीत झालेले नाही. सहिष्णूतेच्या व समन्वयवादी दृष्टीच्या या संस्कृतीच्या वैशिष्ठयामुळेच हे सातत्य कायम टिकलेले असते. त्यामुळे निरनिराळया ऐतिहासिक कालखंडात धार्मिक आचार व विधीचे स्वरुप बदलत गेले असले तरी या संस्कृतीचा धार्मिक विचाराचा मूळ अध्यात्मिक गाभा कायमच राहिला आहे. निरनिराळया कालखंडातील धर्माच्या स्वरुपाची आचार विचारांची देवदेवतांची ऐहिक जीवन विषयक विचारांची व तत्वज्ञानाची माहिती घेणे आवश्यक ठरते.
     धर्माधिष्ठित भारतीय संस्कृती श्रेष्ठ पदाला नेण्याचे श्रेय थोरलोकांच्या महान परंपरेकडे जाते. या परंपरेत प्राचीन तमकाळातील श्रेष्ठ पदाला गेलेल्या ऋषीमुनींच्या तपस्व्यांचा, विद्वानांचा समावेश होतो. हे प्रणेते भारतीय संस्कृतीच्या शलाका आहेत. असे असले तरी या पूर्वीही एक अज्ञात संस्कृती होती, ती म्हणजे सिंधू संस्कृती या संस्कृतीतील लोक निश्चित कोणत्या धर्माचे होते हे सांगता येत नाही. त्यांचे धार्मिक तत्वज्ञ गान सांगणारा एकही ग्रंथ सापडलेला नाही. उत्खननात सापडलेल्या मुर्तीवरुन त्या लोकांच्या धार्मिक कल्पना विषयी काही अनुमान काढता येतात. मोहोंजदडोच्या अवशेषात एक शिवाची त्रिमुखी मूर्ती सापडली आहे. यावरुन हे लोक शिवाची भक्ती करीत असावेत.
    सिंधू संस्कृतीनंतर जी संस्कृती उदयाला आली आणि उत्कर्षाप्रत पोहोचली तिला वैदिक संस्कृती असे नाव मिळाले. वैदिक संस्कृतीतील धर्म अत्यंत साधा होता. यातील देवतांमध्ये प्रामुख्याने इंद्र दिसतो. तसेच अग्नी, वरुण, पर्जन्य, उषस, आश्विन इत्यादी देव दिसतात. ऋग्वेदात आर्याच्या टोळयांचे उल्लेख मिळतात. सप्त सिंधूच्या प्रदेशात वास्तव्य करीत असतानाच आर्यांनी ऋग्वेदाची निर्मिती केली. ऋग्वेदात अंतर्भूत असलेल्या माहितीवरुन त्यांच्या धार्मिक जीवनावर प्रकाश टाकता येतो. ऋग्वेद कालीन समाजाचा जीवन विषयक दृष्टीकोन प्रवृत्तीवादी होता. प्रवृत्तीवादी दृष्टीकोनातूनच देवदेवतांची प्रार्थना केलेली दिसते. ऋऋग्वेदातील धर्म हा निसर्गाधिष्ठीत होता. भोवतीच्या निसर्गात जाणवणाऱ्या वैचित्र्यामागे कोणतीतरी शक्ती असावी किंवा चैतन्य तत्व असावे असे मानलेले होते. या निसर्गातील चैतन्यशक्तींना किंवा निसर्गातील विविध तत्वांनाच देवदेवता मानण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऋग्वेद कालीन धर्मात मूर्ती पूजेचे अस्तित्व आढळत नाही.
     उत्तर वैदिक लोकांच्या जीवनात आणि धार्मिक कल्पनात मोठे बदल घडून आले. या काळातील आचारधर्म, तत्वज्ञान विषयक विचार आणि ईश्वर विषयक यात बदल झाला. वेदकाळाच्या प्रारंभीचे सहज सुलभ व निसर्गाधिष्ठित धार्मिक जीवन नष्ट होऊन धर्माला आचाराधिष्ठीत कर्मकांडाचे स्वरुप मिळाले. उत्तर वैदिक काळानंतर पुराणांच्या काळात वैदिक काळातील देव देवतांचे महत्व कमी होवून, ब्रम्हा, विष्णू, महेश, गणेश इत्यादी नवीन देवदेवतांचा उदय झाला.
     मौर्य काळात वैदिक धर्माची बरीच पिछेहाट झाली होती. इंद्र, वरुण, गणेश यांची उपासना चालू होतीच, त्यातच विष्णू, शिव, सूर्य यांच्या पूजेची भर पडली. मौर्योत्तर काळात वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाची एक मोठी लाटच निर्माण झाली. गुप्त काळात या चळवळीचा बराच विकास झाला. गुप्तांनी जुन्या यज्ञ परंपरेला चालना देण्याचा प्रयत्न केला. अनेक राजांनी यज्ञ केलेही परंतु बहुजन समजात त्याला लोकप्रियता लाभली नाही. वैदिक देवता लुप्तप्राय झाल्या व नवीन स्वरुपात रुपांतरीत झाल्या. ब्रम्हा, विष्णू, महेश या देवतांना प्राधान्य प्राप्त झाले. यज्ञाची जागा मूर्तीपूजेनी घेतली सर्वच पंथात मूर्तीपूजा अतिशय लोकप्रिय झाली त्यातूनच भागवत धर्माचा उदय झाला. अनेक राजे स्वतःला " परमभागवत" व " परमवैष्णव" म्हणवून घेत. २५ याच काळात शैव व वैष्णव पंथाची वाढ झाली. वैष्णव पंथाला राजमान्यता मिळाली. गुप्तसम्राटांनी हिंदू धर्माला आश्रय दिल्यामुळे मूर्तीपूजेला उत्तेजन मिळाले. मोठ्या प्रमाणात विष्णूची, शिवाची मंदिरे बांधली गेली. अवतार कल्पनेचा   विकास होवून विष्णूच्या अनेक अवतारांची पूजा सुरु झाली. 

वैष्णव पंथ :- 

      पुराणोक्त धर्मानुसार भक्ती, व्रतवैकल्ये, पूजा, तिर्थ यात्रा यांना महत्वाचे स्थान मिळाले. भक्ती म्हणजे सगूण निर्गुण देवदेवतांचे अस्तित्व मानले जाते. भक्तीपंथाची सुरवात निश्चित केव्हा झाली हे सांगता येत नाही पुराण काळात निर्गुण उपासनेबरोबरच सगुण उपासनेला महत्व मिळाले. काही पुराणांनी विष्णूला तर काही पुराणांनी शक्तीला सर्वश्रेष्ठ परमेश्वर मानले त्यातूनच धर्मपंथाचा उगम झाला. विष्णूला श्रेष्ठ मानणारा हिंदू धर्म पंथ म्हणजेच वैष्णव पंथ, भक्ती विचार सरणीवर आधारलेल्या या संप्रदायाला अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. कोणत्याही धार्मिक विधी किंवा आचारापेक्षा परमेश्वराचे श्रेष्ठत्व त्याला समर्पित होण्याचा साधा सुलभ मार्ग भक्ती संप्रदायाच्या द्वारे दाखविण्यात आला. भगवद् गीतेतून भक्तीपंथाच्या या शिकवणूकीला चालना देण्यात आली. केवळ भक्ती मार्गाच्या द्वारेच परत्म्याशी ऐक्य प्रस्थापित करणे शक्य होते, मोक्ष मिर्लावता येतो असा विशेष या शिकवणुकीच्या माध्यमातून देण्यात आला. त्यामुळेच भक्तीपंथावर आधारलेल्या वैष्णवसंप्रदायाला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली.
    विष्णू देवतेला सर्व शक्तीमान व श्रेष्ठ समजून त्याची उपासना करणारा पंथ तो वैष्णवपंथ होय. विष्णूची वेगवेगळया रुपात उपासना केली जाते. वैष्णवपंथाचे उल्लेख विविध ग्रंथात सापडतात त्यात प्रामुख्याने वैदिक साहित्य, पुराणग्रंथ, भागवतगीता, भागवत पुराण. यांना साधन म्हणून विशेष महत्व दयावं लागेल. वैष्णव पंथाची परंपरा वेदाइतकीच प्राचीन आहे असे मानले जाते. ऐतरेय ब्राम्हण ग्रंथात विष्णूला सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. धर्मशास्त्रकारांनी सर्व देवतांमध्ये विष्णूला महत्वाचे स्थान दिले असून मोक्ष मार्गावरील अंतिम स्थान म्हणजे "विष्णूपद" असे म्हटले आहे. "

वैष्णवपंथाचा आरंभ

    सिंधू संस्कृतीच्या काळात विष्णूदेवतेचे अवशेष मिळाले नाहीत. ऋग्वेदात मात्र विष्णूचे उल्लेख असून त्याची प्रार्थना करणारे सुक्तेही आहेत. ऋग्वेदात एकूण सहा सुक्तात त्याचे उल्लेख मिळतात. इतर देवतांच्य मानाने हि सुक्तांची संख्या कमी असली तरी त्यात असलेले वर्णन अत्यंत उदात्त आहे. काही सुक्तात इंद्रा-विष्णू या नावाने इंद्र व विष्णू अशा तोड देवतांचे स्तवन केले आहे. ऋग्वेदात काहींच्या मते विष्णू आदित्यरुप आहे तर काहींच्या मते अवकाश देवता आहे. ऋग्वेदाच्या मानाने यजुर्वेदात विष्णूला जास्त मानाचे स्थान आहे. यजुर्वेदात अग्नीच्या खालोखाल श्रेष्ठ स्थान विष्णूला आहे. तो जगाची उत्पत्ती करणारा, तीन पावलात द्युलोक, अंतरीक्ष व पृथ्वी व्यापणारा, अणूरेणू मध्ये वास करणारा पृथ्वीला तेज देणारा असे त्याचे स्थान आहे.
    उत्तर बंद काळात यज्ञीय आचाराला महत्वाचे स्थान मिळण्यास सुरुवात झाली व विष्णू देवता ही सर्वात महत्वाची देवता मानली जाण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात वैष्णवपुराणांनी विष्णू देवतेचे महत्व वाढविले. याच काळात विष्णूच्या निरनिरळ्या अवतारकथा सागण्यात आल्या. अवतारांची निरनिराळे रुपे मांडण्यात आली. या प्रत्येक अवतारांच्या वेळी विष्णूने मानवी जीवनाच्या संरक्षणाचेच सर्वश्रेष्ठ कार्य केल्याचा विचार मांडला गेला.
    इतिहास काळात प्रामुख्याने गुप्तकाळात वैष्णवपंथाला लोकप्रियता मिळाली. गुप्त काळात पौराणिक हिंदू धर्माच्या उत्कर्षाची चढती कमान होती. वैष्णव पंथात गोकूळातील कृष्ण लीला व गोपाळ कृष्ण भक्ती यांना विशेष महत्व प्राप्त झाले. नाथमुनी वैष्णवाचार्यानी दहाव्या शतकात श्री वैष्णव पंथाची स्थापना केली. "वैष्णव पंथाने मोक्ष प्राप्तीसाठी भक्तीमार्गाचा अतिशय सहज सुलभ मार्ग दाखविला. या काळात हिंदू धर्मातील कर्मकांडाचे प्राबल्य नष्ट झाले. इतकेच नव्हे तर इस्लाम धर्माच्या धार्मिक आक्रमणापासून हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे काम वैष्णव धर्माने केले. पुराणांनी वैदिक धर्म व वैष्णवधर्म यांची योग्य सांगड घालून हिंदू धर्माचा पाया घातला. हिंदू धर्म हि एकांतिक विचार प्रणाली नाहो किंवा विशिष्ठ देवतांचा उपासनापंथ नाही. हिंदू धर्म हा अनेक धर्मपंथाचे संघराज्य आहे.
    वैष्णव पंथामध्ये यथावकाश काही उपपंथ निर्माण झाले. या विविध संप्रदायानी निर्माण केलेल्या साहित्यामुळे संस्कृत, प्राकृत साहित्यात मोठ्या प्रमाणावर भर पडली असल्याची दिसते. वैष्ण पंथात पुढील संप्रदाय बरेच लोकप्रिय झाले त्या मध्ये त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल असा संप्रदाय म्हणजे.

वारकरी संप्रदाय :-

   वारकरी संप्रदाय हे विशाल आणि व्यापक वैदिक धर्माचेच एक विकसित रुप आहे. भक्तीच्या प्रांगणात समतेच्या तत्वावर वैष्णवाची मांदियाळी एकवटली. ज्ञानेश्वरांनी या मंदिराची पायाभरणी केली व तुकोबांनी त्यावर कळस चढविला. नामदेवांनी आपल्या अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाचा प्रसार करुन समाजात भगवद् भक्ती जागृत केली. एकनाथानी नामदेवांचे अपुरे काम पूर्ण केले. या संप्रदायाच्या उपासकाला वारकरी म्हणतात . वर्षातून आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करणाऱ्याला वारकरी म्हणतात. त्यांच्या गळयात तुळशीच्या माळा असतात म्हणून त्यांना माळकरी पण म्हणतात. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा व पंढरीच्या वारीमध्ये खांदयावर भगवी पताका ही वारकऱ्यांची बाहय वैशिष्टये आहेत. कोणताही जातीभेद या संप्रदायात मानला जात नाही. निस्सिम भक्तीच्या द्वारे परमेश्वराची समर्पणाच्या भूमिकेतून उपासना केल्यास निश्चितपणे मोक्ष प्राप्ती होते असा विश्वास या संप्रदायाच्या संतानी सामान्य जनतेला दिला आहे. २३१ वारकरी संप्रदायाबरोबरच इतर सर्व वैष्णव संप्रदायाचे कार्यही उल्लेखनीय आहे. त्यात आळवार संप्रदाय
    चैतन्य संप्रदाय
    कबीर संप्रदाय
   वल्लभ संप्रदाय
    महानुभव पंथ
    बैरागी संप्रदाय
यांचा समावेश होतो.

 प्रतिष्ठित केलेल्या अनाकलनीय शक्तीची उपासना करीत असते. भारतीय विचारधारेप्रमाणे उपसनेचे लक्ष्य निर्गुण परब्रम्हाशी असते निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना ही सगुण साकार देवाच्या उपासनेपेक्षा श्रेष्ठ मानली आहे. मूर्तीपूजेच्या इतिहासाचा दुसरा टप्पा म्हणजे सुरुवातीच्या काळात तांब्याच्या व काहीशा मानवाकार वस्तु होत वैदिक युगातील मूर्तिपूजेच्या आस्तित्वाबद्दल मतभिन्नता आहे. मूर्तिपूजेच्या प्राचीनतेचा विचार करीत असताना वेदकालापर्यंत पाहिले तर त्यानंतरच प्रतिमापूजनाचे बरेच उल्लेख मिळू लागतात. कुषाणकालात मूर्तिविज्ञानाचा चांगलाच विस्तार होऊ लागला. मूर्तिविज्ञानाचा पाया येथूनच पुढे स्पष्टपणे वर येताना दिसतो. मूर्ती घडविण्यासंबंधी निरनिराळे प्रयोग येथूनच पुढे सुरू झाले. आणि वाङमय व कला या दोन्ही क्षेत्रात वाढीस लागले.

• मूर्तिकलेची वाटचाल

भारतात मूर्तिकला फार प्राचीन काळापासून आढळते. मूर्तिकलेचा उगम शोधायचा म्हटले तर वेदकाळाच्याही मागे जावे लागते. मूर्तिकलेच्या विविध अंगांची माहिती आणि नियम अनेक पुराणात दिले आहेत त्यादृष्टीने मत्स्य, अग्नी, पद्म आणि विष्णुधर्मोत्तर ही पुराणे महत्वाची आहेत. त्यात प्रतिमालक्षण, प्रतिमेची प्रतिष्ठा, देवगृहनिर्माण इ. विषयांचे विवरण केलेले आहे. देवतांच्या मूर्ती बनविणे, त्यांची प्राणप्रतिष्ठा इ.चे नियम दिले आहेत. मूर्तीशास्त्रात मूर्तीचे विविध प्रकार कल्पिलेले आहेत. त्यात काष्ठ, माती, धातू, पाषाण ई. चा समावेश होतो .

मूर्तीचे प्रकार

• काष्ठमूर्ती मूर्ती बनविण्यासाठी देवदार, चंदन, शमी, मधुक, अश्वत्थ,

खैर, बेल, जीवक, सिन्धुक, केशर, अम्र, शाल, मंदार या वृक्षाचे लाकूड योग्य असते.

प्रारंभी मूर्ती या लाकडाच्याच बनवीत असत. ज्या प्रकारची लाकडाची मूर्ती बनवायची

ते लाकूड लगेच उपलब्ध नसे. मग योग्य वृक्ष निवडायचा, तो तोडून घरी आणायचा

नंतर कालांतराने या मूर्ती घडविल्या जात. या मूर्ती बनविताना वापरायचे लाकूड चरे

पडलेले नसावे. भंगलेले नसावे. गाठाळलेले, किडलेले नसावे तर ते सुंदर व मजबूत

[20/06, 10:16 pm] Swapnil Jirage: असावे. उदा. जगन्नाथपुरी येथील जगन्नाथ (कृष्ण) बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती या काष्ठमूर्ती आहेत.

• मातीच्या मूर्ती मूर्तिकलेचा इतिहास हा फार प्राचीन आहे. मृण्मयी मूर्तीचा शोध घेण्यासाठी वैदिक काल ओलांडून त्याच्याही पलिकडे इ. सना पूर्वी २५०० वर्षांमागे जावे लागते. कारण प्रथमतः मृण्मयी मूर्तीचा शोध तेव्हाच लागलेला आहे. सिंधू संस्कृतीच्याही आधीपासून मृण्मयी मूर्ती बनविल्या जात असल्या आणि थेट आजपर्यंत त्या बनविल्या जात असल्या तरी ज्यामध्ये कलेचा अंश सापडतो अशा मूर्ती फारच कमी आहेत. मृण्मयी मूर्ती बनविण्यासाठी नदीच्या काठची माती आणावी. तिच्यात समभाग दगडाचे चूर्ण, वाळू, व लोहचूर्ण मिसळावे. काही तुरट पदार्थ काही लाकडाचे अर्क, दही, दूध व तूप हे पदार्थ त्या मातीत एकजीव करावे तो सर्व लगदा महिनाभर तसाच ठेवावा व नंतर त्याची मूर्ती बनवावी असे वर्णन हयशीर्षपंचरात्र या ग्रंथात दिले आहे. नैमित्तिक व्रतासाठी अशा नूर्ती बनवितात व व्रत संपल्यानंतर त्याचे विसर्जन करीत." मातीच्या मूर्तीचे दोन प्रकार असत. एक पक्व म्हणजे पूर्ण भाजलेली (चिरंजीव) व एक अपक्व म्हणजे कच्ची (तात्कालिक) पक्व मूर्ती श्रेष्ठ असल्यातरी विसर्जनासाठी अपक्व मूर्ती चांगल्या असतात. उदा. गणपती, हरितालिका इ.

धातूमूर्ती - ही कला भारतीयांना प्राचीन काळापासून अवगत होती असे म्हणावे लागेल . धातुच्या मूर्ती या ओतीव असत. कांसे या धातुच्या लहान मूर्ती ओतण्या चे विधान मधुच्छिष्ट विधान या नावाने ओळखले जात होते." मधुच्छिष्ट म्हणजे मेण. कलाकार प्रथम मेणाची प्रतिमा बनवून तिच्यावर मातीचे तीन थर थापीत. माती नीट सुकली की मेणाला आच देऊन वितळवीत त्यामुळे मूर्तीचा साचा तयार होई नंतर त्या साच्यात धातूचा रस ओतीत. रस थंड होऊन मूर्ती बनली की तो साचा फोडीत. आतली मूर्ती नंतर घासून पुसून साफ करीत. धातुच्या मोठ्या मूर्ती बनविणे मात्र कष्टाचे असते. गुप्तकाळपर्यंत कलाकार. अशा मूर्ती बनवीत. गुप्तकाळातील बुद्धमूर्ती व नंतरच्या काळातील मंजुश्रीची मूर्ती हि दोन उदाहरणे आहेत. भारतीय मूर्ती संभारात पंचलोह,

BARE BALASAHEВ КРАСПЕКТО ИН48

SHIVAJI UNIVERE, кни

[20/06, 10:16 pm] Swapnil Jirage: तांबे, पितळ, चांदी, सोने यांच्या मूर्ती विपुल प्रमाणात सापडतात. घरातील पूजेच्या मूर्ती प्रामुख्याने धातुच्याच असतात. चोलांच्या काळात कास्यमूर्तीना विशेष बहर आला होता.

• पाषाणमूर्ती - बहुतेक देवस्थानात प्राणप्रतिष्ठा करुन कायमच्या बसविलेल्या मूर्ती

मुख्यतः पाषाणाच्याच असतात अशा मूर्ती कशा घडवाव्यात याचे तंत्र अनेक ग्रंथातून सांगितले आहे चांगला पाषाण कोणता ते ओळखून त्याची अंतरंगपरीक्षा कशी करावी ? भूस्तर शास्त्रानुसार पाषाणाचे बाल, युवा, मध्य वृध्द इ. प्रकार कसे ओळखावे हे कळते. पाषाणमूती घडविण्यासाठी छिन्नी व हातोडीचा उपयोग करतात. मौर्य काळापासून अशा पाषाणमूर्ती घडू लागल्या. या काळात आठ ते दहा हात उंचीच्या पाषाणमूर्ती आढळल्या. परखम नावाचा यक्ष इ.स.पूर्व सातव्या शतकातला असून भारतीय मूर्तिशिल्पात हा पुतळा सर्वात प्राचीन मानला जातो.

वेदकालानंतर सुमारे दोन हजर वर्षाच्या काळातल्या मूर्ती उपलब्ध होत नाहीत नाहीत. मौर्यकाळाच्या प्रारंभाला महाजनपदयुग म्हणतात. कुषाण कालीन गांधार शैलीतील मूर्तीवर देशी विदेशी छाप दिसते; पण मथुरा शैलीतील कला शुध्द भारतीय दिसते तर शुग युगातल्या मूर्ती पोषाखावरुन ओळखता येतात. या काळात माती व पाषाण दोन्हीही मूर्ती घडू लागल्या. गुप्त काळात भारतीय कलेचा परमोत्कर्ष झालाआणि भारतात मूर्ती व कला सर्वांगानी बहरल्या. १४

मूर्तीलक्षणे -----

मूर्तीकलेच्या आरंभी तिचे निय्म किंवा शास्त्र निर्माण झाले नव्हते. एखादी मूर्ती कलाकाराच्या अंतरात जशी स्फुरेल तशी तो घडवायचा. पण पुढे दैवत संप्रदाय वाढीस लागले. देवतेसंबंधी ब-याच गोष्टी निश्चित झाल्या मग पुढे मूर्तिकारांना तो सर्व तपशिल लक्षात घेऊन मूर्ती घडवाव्या लागत. या सर्व तपशिलाच्या प्रकारांनाच मूर्तिकलेची परिभाषा म्हणतात

१०
[20/06, 10:16 pm] Swapnil Jirage: मूर्तिशास्त्रानुसार मूर्तीचे काही प्रकार -----

• चल - या प्रकारातील मूर्ती लहान व हलक्या असतात. म्हणून त्या धातूच्या बनविलेल्या असतात. त्यांना उत्सवमूर्ती म्हणतात मिरवणूक किंवा धार्मिक कृत्ये यासाठी या मूर्ती उपयोगात आणतात .

• अचल - या प्रकारातील मूर्ती प्रामुख्याने पाषाणाच्या असून त्यांची देवळात कायमची प्रतिष्ठा करतात .

• चलाचल या प्रकारातील मूर्ती काही काळ चल तर काही काळ अचल असतात उदा. तुळजापूरची भवानी मूर्ती. या मूर्तीचा वर्षातून काही शयनकाल ठरलेला आहे. या काळात ती मूर्ती उचलून शेजघरात पलंगावर झोपवितात .

• चित्र - या प्रकारात मूर्ती मागून पुढून कोरलेली व सगळे अवयव व्यवस्थित दाखविणारी असते .

• अर्धचित्र - या प्रकारात मूर्ती पाठशिळेवर उठावात कोरलेली असते .

• चित्रार्ध या प्रकारात भिंतीत, दगडात, छतावर, खांबावर, गोपूरावर या मूर्तीचा दर्शनीय भागच दिसतो.

• चित्राभास - या प्रकारात मूर्ती कापडावर रंगविलेली असते."

मूर्तीचे भंग

उभ्या मूर्ती ज्या चार भिन्न अवस्थेमध्ये बनविलेल्या असतात त्या अवस्थांना

मूर्तीशास्त्राच्या पारिभाषिक शब्दात भंग असे म्हणतात. मूर्तीचे सौंदर्य तिच्या भंगात असते.

• समभंग - दोन्ही पायावर सारखा भार देऊन शरीर कुठेही न वाकविता ताठ उभे राहणे

आणि त्या वेळी दृष्टी समोर असणे याला समभंग असे म्हणतात.

• आभंग शरीराचा वरचा व खालचा भाग या अवस्थेत किंचित वक्र असतो .

टाळूपासून निघालेली लंबरेषा नाभीच्या किंचित उजव्या बाजूने जाते.

११
[20/06, 10:16 pm] Swapnil Jirage: • त्रिभंग मस्तक डाव्या किंवा उजव्या बाजूस कललेले धड डाव्या किंवा उजव्या बाजूस वाकलेले अशा अवस्थेला त्रिभंग म्हणतात त्रिभंगामुळे मुर्तीला डौल येतो; पण अशा मूर्ती तुरळक असतात.

• अतिभंग यात त्रिभंगापेक्षा अधिक वक्रता असते वरचा भाग पुढे, मागे किंवा एका बाजूला बराच झुकलेला असतो. उग्र देवता, क्रोध देवता यांच्या मूर्ती या अवस्थेत असतात. १६

मूर्तीचे त्रिगुण

• सात्विक - उदा. योगरूढ स्थितीत विष्णू, विट्ठल, व्यंकटेश.

• राजस उदा. नटराज.

• तामस उदा. नरसिंह, काली, चामुंडा.

मूर्तिकलेतील आसने

मुर्तीच्या सौंदर्याचे व सामर्थ्याचे यथार्थ दर्शन होण्यासाठी तिची बैठक विशिष्ठपणे ठेवणे म्हणजे आसन होय. मूर्ती घडविताना तिच्या पायांची विशिष्ठ ठेवण मनात ठरवून, तशा प्रकारची घडण करून ती बसविलेली दाखवणे म्हणजे तिचे आसन होय. यामधून त्यादेवतेची अवस्था मानवाच्या अवस्थेहून भिन्न आहे हे सूचित करावयाचे असते. आसने ही मूर्तीचे भाव आणि दैवी गुण प्रकट करतात.

• अर्धपर्यंक पद्मासन घालून व एक मांडी कोणतेतरी उशीसारखे आसन देऊन थोडी वर उचलणे.

• आलीढ डावा पाय गुढघ्यात वाकवून पुढे घ्यावयाचा आणि उजवा पाय ताठ पण तिरका मागे ठेवायचा.

• उत्कटित पाय सरळ उभे ठेवून किंवा त्याना तिढा घालून उकिडवे बसणे.

• कूर्म - दोन्ही पायाच्या टाचा मागे चिकटलेल्या रहतील अशा प्रकारे मांडी घालणे.

• पद्म - दोन्ही पायांच्या टाचा उलट बाजूला जांघात बसतील अशा प्रकारे मांडी घालणे

• पर्यक साधी मांडी घालून बसणे.

BARR. BALASAHEB KHARDEKAR LIBRARY

SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR.

१२
[20/06, 10:17 pm] Swapnil Jirage: सर्वश्रेष्ठ परमेश्वर मानले त्यातूनच धर्मपंथाचा उगम झाला. विष्णूला श्रेष्ठ मानणारा हिंदू धर्म पंथ म्हणजेच वैष्णव पंथ, भक्ती विचार सरणीवर आधारलेल्या या संप्रदायाला अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. कोणत्याही धार्मिक विधी किंवा आचारापेक्षा परमेश्वराचे श्रेष्ठत्व त्याला समर्पित होण्याचा साधा सुलभ मार्ग भक्ती संप्रदायाच्या द्वारे दाखविण्यात आला. भगवद् गीतेतून भक्तीपंथाच्या या शिकवणूकीला चालना देण्यात आली. केवळ भक्ती मार्गाच्या द्वारेच परत्म्याशी ऐक्य प्रस्थापित करणे शक्य होते, मोक्ष मिर्लावता येतो असा विशेष या शिकवणुकीच्या माध्यमातून देण्यात आला. त्यामुळेच भक्तीपंथावर आधारलेल्या वैष्णवसंप्रदायाला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली.

विष्णू देवतेला सर्व शक्तीमान व श्रेष्ठ समजून त्याची उपासना करणारा पंथ तो वैष्णवपंथ होय. विष्णूची वेगवेगळया रुपात उपासना केली जाते. वैष्णवपंथाचे उल्लेख विविध ग्रंथात सापडतात त्यात प्रामुख्याने वैदिक साहित्य, पुराणग्रंथ, भागवतगीता, भागवत पुराण. यांना साधन म्हणून विशेष महत्व दयावं लागेल. वैष्णव पंथाची परंपरा वेदाइतकीच प्राचीन आहे असे मानले जाते. ऐतरेय ब्राम्हण ग्रंथात विष्णूला सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे. धर्मशास्त्रकारांनी सर्व देवतांमध्ये विष्णूला महत्वाचे स्थान दिले असून मोक्ष मार्गावरील अंतिम स्थान म्हणजे "विष्णूपद" असे म्हटले आहे. "

वैष्णवपंथाचा आरंभ

सिंधू संस्कृतीच्या काळात विष्णूदेवतेचे अवशेष मिळाले नाहीत. ऋग्वेदात मात्र विष्णूचे उल्लेख असून त्याची प्रार्थना करणारे सुक्तेही आहेत. ऋग्वेदात एकूण सहा सुक्तात त्याचे उल्लेख मिळतात. इतर देवतांच्य मानाने हि सुक्तांची संख्या कमी असली तरी त्यात असलेले वर्णन अत्यंत उदात्त आहे. काही सुक्तात इंद्रा-विष्णू या नावाने इंद्र व विष्णू अशा तोड देवतांचे स्तवन केले आहे. ऋग्वेदात काहींच्या मते विष्णू आदित्यरुप आहे तर काहींच्या मते अवकाश देवता आहे. ऋग्वेदाच्या मानाने यजुर्वेदात विष्णूला जास्त मानाचे स्थान आहे. यजुर्वेदात अग्नीच्या खालोखाल श्रेष्ठ स्थान विष्णूला आहे. तो जगाची उत्पत्ती करणारा, तीन पावलात द्युलोक, अंतरीक्ष व पृथ्वी व्यापणारा, अणूरेणू मध्ये वास करणारा पृथ्वीला तेज देणारा असे त्याचे स्थान आहे.

उत्तर बंद काळात यज्ञीय आचाराला महत्वाचे स्थान मिळण्यास सुरुवात झाली व विष्णू देवता ही सर्वात महत्वाची देवता मानली जाण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळात वैष्णवपुराणांनी विष्णू देवतेचे महत्व वाढविले. याच काळात विष्णूच्या निरनिरळ्या अवतारकथा सागण्यात आल्या. अवतारांची निरनिराळे रुपे मांडण्यात आली. या प्रत्येक अवतारांच्या वेळी विष्णूने मानवी जीवनाच्या संरक्षणाचेच सर्वश्रेष्ठ कार्य केल्याचा विचार मांडला गेला.

इतिहास काळात प्रामुख्याने गुप्तकाळात वैष्णवपंथाला लोकप्रियता मिळाली. गुप्त काळात पौराणिक हिंदू धर्माच्या उत्कर्षाची चढती कमान होती. वैष्णव पंथात गोकूळातील कृष्ण लीला व गोपाळ कृष्ण भक्ती यांना विशेष महत्व प्राप्त झाले. नाथमुनी वैष्णवाचार्यानी दहाव्या शतकात श्री वैष्णव पंथाची स्थापना केली. "वैष्णव पंथाने मोक्ष प्राप्तीसाठी भक्तीमार्गाचा अतिशय सहज सुलभ मार्ग दाखविला. या काळात हिंदू धर्मातील कर्मकांडाचे

२०
[20/06, 10:17 pm] Swapnil Jirage: प्राबल्य नष्ट झाले. इतकेच नव्हे तर इस्लाम धर्माच्या धार्मिक आक्रमणापासून हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे काम वैष्णव धर्माने केले. पुराणांनी वैदिक धर्म व वैष्णवधर्म यांची योग्य सांगड घालून हिंदू धर्माचा पाया घातला. हिंदू धर्म हि एकांतिक विचार प्रणाली नाहो किंवा विशिष्ठ देवतांचा उपासनापंथ नाही. हिंदू धर्म हा अनेक धर्मपंथाचे संघराज्य आहे.

वैष्णव पंथामध्ये यथावकाश काही उपपंथ निर्माण झाले. या विविध संप्रदायानी निर्माण केलेल्या साहित्यामुळे संस्कृत, प्राकृत साहित्यात मोठ्या प्रमाणावर भर पडली असल्याची दिसते. वैष्ण पंथात पुढील संप्रदाय बरेच लोकप्रिय झाले त्या मध्ये त्यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल असा संप्रदाय म्हणजे.

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदाय हे विशाल आणि व्यापक वैदिक धर्माचेच एक विकसित रुप आहे. भक्तीच्या प्रांगणात समतेच्या तत्वावर वैष्णवाची मांदियाळी एकवटली. ज्ञानेश्वरांनी या मंदिराची पायाभरणी केली व तुकोबांनी त्यावर कळस चढविला. नामदेवांनी आपल्या अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाचा प्रसार करुन समाजात भगवद् भक्ती जागृत केली. एकनाथानी नामदेवांचे अपुरे काम पूर्ण केले. या संप्रदायाच्या उपासकाला वारकरी म्हणतात . वर्षातून आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरची वारी करणाऱ्याला वारकरी म्हणतात. त्यांच्या गळयात तुळशीच्या माळा असतात म्हणून त्यांना माळकरी पण म्हणतात. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा व पंढरीच्या वारीमध्ये खांदयावर भगवी पताका ही वारकऱ्यांची बाहय वैशिष्टये आहेत. कोणताही जातीभेद या संप्रदायात मानला जात नाही. निस्सिम भक्तीच्या द्वारे परमेश्वराची समर्पणाच्या भूमिकेतून उपासना केल्यास निश्चितपणे

मोक्ष प्राप्ती होते असा विश्वास या संप्रदायाच्या संतानी सामान्य जनतेला दिला आहे. २३१ वारकरी संप्रदायाबरोबरच इतर सर्व वैष्णव संप्रदायाचे कार्यही उल्लेखनीय आहे. त्यात आळवार संप्रदाय

चैतन्य संप्रदाय

कबीर संप्रदाय

वल्लभ संप्रदाय

महानुभव पंथ

बैरागी संप्रदाय

यांचा समावेश होतो.

संदर्भग्रंथ सूची

१. जोशी महादेवशास्त्री, भारताची मूर्तिकला पृ.१

२. कित्ता, भारताची मूर्तिकला; पृ. १

३. कित्ता. भारताची मूर्तिकला; पृ. १

४. जोशी महादेवशास्त्री भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा; पृ.४६२

५. कित्ता, भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा पृ.४६२

६. कित्ता, भारताची मूर्तिकला पृ. २

७. कित्ता, भारताची मूर्तिकला; पृ. ३

BARR. BALASAHEB KHARDEKAR LIBRARY

SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR,

२१
[20/06, 10:17 pm] Swapnil Jirage: ८. कित्ता, भारताची मूर्तिकला, पृ. ७

९. कित्ता, भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा पृ. ४४६

१०माटे म. श्री. प्राचीन भारतीय कला; पृ. ४४

११. कित्ता, भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा; ४४७

१२. कि त्ता, भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा : ४५५

१३. कित्ता, भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा; ४४६

१४. कित्ता, भारताची मूर्तिकला, पृ. १२४

१५. कित्ता, भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा पृ. ४४९

१६. कित्ता, भारतीय संस्कृतीकोष, खंड सातवा; पृ. ४४९

१७. कित्ता, भारताची मूर्तिकला पृ. ९९

१८. कित्ता, भारताची मूर्तिकला; पृ. १०४

१९. कित्ता, भारताची मूर्तिकला; पृ. १०१

२०. कित्ता, भारताची मूर्तिकला; पृ. १०५

२१. भिडे ग.ल., प्राचीन भारत पृ. २

२२. तांबे व.द. व काटदरे मा. गो. प्राचीन भारत; पृ. ३७

२३. कोलारकर श.गो. भारताचा इतिहास पृ. ६

२४. भिडे ग.ल.. प्राचीन भारत : पृ. २६

२५. गायधनी र.ना. व राहूरकर व.ग. प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास; पृ. २६८

२६. कित्ता, भारताचा इतिहास; पृ. १३३

२७. भिडे ग.ल. प्राचीन भारत; पृ. ३२४

२८. भिडे ग.ल. प्राचीन भारत: पृ. ३२४

२९. कित्ता प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास; पृ. २७९

३०. कित्ता. प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास; पृ.३४८

३१. गोसावी र.स., पाचाभक्ती संप्रदाय; पृ. १५६

२२
[20/06, 10:17 pm] Swapnil Jirage: भारतीय मूर्तिविज्ञान एक संक्षिप्त आढावा ----

• प्रास्ताविक

भारतातील मूर्तिविज्ञान हे नेहमीच एक औत्सुक्याचा विषय बनून राहिले आहे. एखादी गोष्ट जवळ नसताना तिच्या विषयी प्रेमादर व्यक्त करण्यासाठी किंवा तिचे स्मारक करण्यासाठी म्हणून तिची प्रतिमा तयार करावयाची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. मानवाची ही अनुभूती व्यक्त करण्याची अभिव्यक्ती म्हणजेच कला होय आणि यातूनच मूर्तिकला उदयास आली असावी कारण ही कला केवळ भावनांचेच प्रदर्शन करते असे नाही, तर अध्यात्मिक संदेशही देते. म्हणूनच ही कला फारच व्यापक चिरंतन आहे, असे म्हणावे लागेल. आदिम जीवन संपले तरी कला जिवंत आहे. इतिहासाच्या विकासात कलेचा उदय कधी झाला हे सांगता येणे कठीण आहे.

कलाकार हा मात्र सत्याचा उपासक आहे असे म्हणावे लागेल. पूर्वी प्राचीन काळी मानव हा संस्कृतीच्या प्राथमिक अवस्थेत होता. त्या आदिम अवस्थेत त्याने देव नावाची वस्तू शोधून काढली. देवतांच्या ठिकाणी प्रचंड शक्ती आहे हे त्याने जाणले. याबरोबरच आणखीही काही शक्ती आहेत, त्या दानवी शक्तींचाही त्याला सुगावा लागला होता. आणि या दैवी व दानवी दोन्ही प्रकारच्या शक्ती विश्वात वास करतात हे त्याने जाणले. तसेच या निसर्गातील डोंगर, नद्या, तळी, वृक्ष, पशु, पक्षी, पाषाण, यातही या शक्तो वास करतात हे त्याला भावले. आणि मग तो या सर्वांचीच पूजा करू लागला. आपल्याभल्याबु-यासाठी त्यांची प्रार्थना करू लागला. संकटाच्या वेळी सर्वांना आळवू लागला. इथेच प्रतीकरुपाने केलेल्या पूजेस सुरुवात झाली.

माणसाची बुध्दी जसजशी विकसीत होऊ लागली, तसतशा देव, दानव विषयक कल्पना त्याच्या मनात आकार घेऊ लागल्या. देवांचे पुसटसे दर्शन त्याच्या मनाला अंतःचक्षूना घडू लागले. मनात मानलेल्या देवाचे स्वरूप त्याच्या नजरेसमोर तरळू लागले. त्याने जो देव मानला तो त्याला भावला. अर्थातच तो मानवरुपातच होता. देव ही कल्पना त्याच्या मनापुढे साकारली. स्वतःच्या ठिकाणी असलेले हातापायातील सामर्थ्य त्याला माहित होते. देव म्हणजे श्रेष्ठ असे त्याला वाटले. आणि देवतांच्या बाबतीत हे सामर्थ्य त्याने

BANG. BABASAHER KHAPDEKO

SHIVAJI UNIVERSDY, BOARA

[20/06, 10:17 pm] Swapnil Jirage: अनंतपटीने वाढविले व त्या रुपातच देवाला पाहिले. पुढे त्याला वाटू लागले, या देवाची मूर्ती घडवावी. सुरुवातीला त्याने मानवी आकृतीचीच योजना केली. स्वतःला अनुकूल देवांच्या मूर्ती माणसाने सौम्य व सुंदर घडवल्या. त्यांच्या ठिकाणी असलेली अफाट शक्ती दर्शविण्यासाठी त्याने मूर्तीला दोनाच्या ऐवजी चार हात लावले. कधी जास्त बळ दर्शविण्यासाठी त्यापेक्षाही अधिक हाताची योजना केली. कोणाला तीन डोळे, तर काहींना दोन तोंडे कधी कधी तर चार सहा दहा अशीही तोंडांची संख्या बनत गेली. अशा देवांची पूजा तो आपल्या कल्याणासाठी मनोभावे करु लागला. देवांच्या मूर्ती सौम्य व अल्हाददायक बनविल्या, तर याच्या उलट दानवांच्या मूर्ती भयानक स्वरुपाच्या बनविल्या. माणूस मूलतः हुषारच. देवांची पूजा तो स्वतःच्या कल्याणासाठी करीत असेच. परन्तु या दानवांचीही पूजा तो त्यांनी आपल्यावर संकटे आणू नयेत म्हणून करु लागला.

इ.सन पूर्व २५०० वर्षापूर्वीचा काळ सर्वात प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. हा सिंधू संस्कृतीचा काल मानतात. सिंधू नदीच्या परीसरात एका प्रगत अशा संस्कृतीची वाढ झालेली असल्यामुळे विद्वान लोक तिला सिंधू संस्कृती म्हणून ओळखतात. सिंध पंजाब प्रदेशात झालेल्या उत्खननात मातीच्या विपूल मूर्ती मिळाल्या. मातृदेवता, शिवदेवता, शिक्क्यावरील पशुपती या मूर्तीवरुन सिंधू संस्कृतीतील लोक मूर्तिपूजा करीत असावेत असे अनुमान संशोधिकेने केले आहे. दक्षिण भारतात जे द्रविड लोक वसलेले आहेत ते मूळचे सिंधू संस्कृतीतील असावेत व त्यांनीच मूर्तिपूजा सुरू केली असावी. कारण पूजा व भक्ती ही द्रविडांची होती व ती आजही आहेत."

यानंतरचा कालखंड म्हणजे वैदिक काळ वैदिक आर्यांची संस्कृती यज्ञप्रधान होती. त्यांनीही काही देव कल्पिलेले होते. देवतांना द्यावयाचे पदार्थ ते अग्निद्वारे समर्पण करीत असत. अग्निद्वारे ते पदार्थ त्या देवतांपर्यंत पोहोचतात ही त्यांच्या मनातील दृढ श्रद्धा होती. इन्द्र, वरुण, आदित्य अशा देवतांची पूजा चाले असे असले तरी वैदिक आर्य मूर्तिपूजक होते कि नाही यात संदेह आहे परंतु वेदांतील अनेक ऋचामध्ये देवतांच्या मानवी आकृर्तीचे वर्णन केले आहे. यावरून वैदिक लोक मूर्ती बनवीत असावेत असे अनुमान निघते. वेदांमध्ये मानवी रूपांचे वर्णन असले तरी वैदिक आर्य त्या मूर्तीची पूजा करीत होते, असे

[20/06, 10:18 pm] Swapnil Jirage: सांगणारी वचने मुळीच सापडत नाहीत. म्हणजे प्राचीन काळी वैदिक धर्मात मूर्तिपूजा नव्हती असे मान्य करण्यास हरकत नाही.

वेदानंतर ब्राम्हणे, आरण्यके निर्माण झाली, त्यानंतर उपनिषदे, भारतात भक्तीधारा प्रवर्तिन करण्याचे श्रेयही उपनिषदांना आहे उपनिषद काळात परब्रह्माची कल्पना रूढ झ गाली परब्रह्माचे निदिध्यासन हेच ईश्वराचे पूजेचे स्वरूप ठरले. या काळात नैसर्गिक वस्तुंचीच पूजा होत असे. देवावर मनुष्यत्वाचा आरोप करणे हा मनुष्याचा स्वभावगुणधर्म आहे. त्यामुळे वेळोवेळी देवतांच्या स्तुतिमध्ये मानवी वर्णने आढळतात. देवतांस मानवी रूपे आहेत; देवतांस कोणतेही रूप नसते, त्या निर्गुण, निराकार असतात किंवा त्या दोन्ही स्वरुपाच्या असतात अशी मते मांडली जाऊ लागली."

मूर्तिपूजा हे हिंदू धर्माचे महत्वाचे अंग मानले जाऊ लागले भारतात मूर्तिपूजा इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे की, अशा प्रकारची पूजा इतर कोणत्याही देशात आढळणार नाही. याला पौराणिक परंपरा आहेत. पौराणिकधर्म पूर्णपणे प्रस्थपित झाल्यावर मूर्तिपूजेलाही बहर आला.

प्राचीन काळी भारतात कला आणि धर्म हातात हात घालून मार्गक्रमित असत. निरनिराळ्या देवतांची शिल्पे डोळे दिपवितात. तर काही देवतांच्या मूर्ती आपल्या सौंदर्याने थक्क करतात याचे कारण ती कसबी लोकांची कला नव्हती, तर भक्तीने भारलेल्या भाविकांची ती देवाच्या चरणी रुजू केलेली सेवा होती. म्हणून त्या कलेच्या मांडणीत आपले नाव कोरून ठेवावे असे त्यांना वाटले नाही. त्या कलाकृती निर्माण प्रसंगी ते जणू कलानिधी ईश्वराशी तद्रुप झाले होते भारतीय कलेचे हे एक वैशिष्ट्यच मानावे लागेल. भारतीय संस्कृतीकोष.

भारतीय मूर्तीशास्त्राचा विकास हळूहळू होत गेला. शास्त्रीय दृष्टिकोनातून मूर्तिशास्त्राला विशेष महत्व आहे सुंदर कलाकृतींनी भारतीय मनाची पकड घेतली; याचे कारण फक्त कलेबद्दलचे प्रेम नसून ती या देशाची अध्यात्मिक परंपरा आहे. भारतीय विचारवंताचे मन केवळ बाह्य सौंदर्यावर भुलले नसून ते आंतरिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यास आसुसलेले असते. ते दगड माती वगैरे माध्यमाची पूजा करीत नसून त्यामध्ये

[20/06, 10:18 pm] Swapnil Jirage: • प्रत्यालीढ आलीढच्या उलटे करणे.

भद्र - दोन्ही पाय लोंबते सोडून उंच पीठावर बसणे.

• योग - पद्मसनामध्ये ध्यान मुद्रा लावणे.

• ललित - उंच जागी एका पायाची मांडी घालून दुसरा पाय लोंबता खाली सोडणे.

• वज्र - पायांचे तळवे उलट बाजूच्या मांड्यावर येतील असे करून तळहात गुडघ्यावर पालथे ठेवणे.

सुख - शरीराला आराम वाटेल अशा प्रकारे बसणे.

• स्वस्तिक पायाची बोटे उलट बाजूच्या गुडघ्याच्या बेचक्यात बसतील अशी मांडी घालणे.

• प्रलंबपादासन - दोन्ही पाय खाली सोडून उंच पीठावर बसणे.

• सोपाश्रय सैलसर मांडी घालून तळपायाची तिढी पुढे ठेवलेल्या कोणत्यातरी आधारावर बसविणे.१७

मूर्तिकलेतील मुद्रा

हाताचा तळवा व बोटे अनेक भिन्न प्रकारच्या अवस्था दर्शवू शकतात. या अवस्थांना मुर्तिकलेच्या परिभाषेत मुद्रा असे म्हाणतात ज्या अवस्थेत दंडापासुन संपूर्ण हाताचा उपयोग केलेला असतो तिला हस्त असे म्हणतात. हस्तही मुद्रांच्याच प्रकारात येतात. मुद्रा किंवा हस्त भिन्न भिन्न दाखवून त्या त्या देवतेच्या भिन्न भिन्न कृर्तीचा बोध करून देणे हे भारतीय मूर्तीशिल्पाचे वैशिष्ट्य आहे.

• अंजली दोन्ही हातांचे तळवे एकमेकाना जोडून डाव्या हाताच्या बोटावर उजव्या

हाताची बोटे व डाव्या हाताच्या अंगठ्यावर उजव्या हाताचा अंगठा टेकविणे. दोन्ही

तळव्यात थोडा फुगवटा ठेवून मनगटापासून पुढील हात जमिनीशी समांतर ठेवणे.

तिला नमस्कार मुद्रा असेही म्हणतात.

१३
[20/06, 10:18 pm] Swapnil Jirage: अभय हाताचा तळवा समोरच्या व्यक्तीकडे वळवून कोपरापासून पुढचा हात उभा धरणे, बोटे ताठ ठेवणे. या मुद्रेने मनाची निर्भयता, सुरक्षितता व स्वस्थता हे भाव प्रकट होतात .

• कटकसिंहकर्ण- चारही बोटांची टोके अंगठ्याच्या टोकाला मिळवून कडे तयार करणे.

• कट्यवलंबित कमरेवर हात ठेवणे.

• कर्णसिंहमुख - तर्जनी व करंगळी सरळ ठेवून मध्यमा व अनामिका तळहातावर दाबून हात लांब करणे.

• कर्तरिहस्त - तळहात जुळवून व विमुख करून खांद्याच्या रेषेत आणणे.

• अर्धचंद्रहस्त- अंगठा व तर्जनी दूर पसरून अर्धचंद्राकृती बनविणे.

• तर्जनी तर्जनी उभी करून बाकीच्या बोटांची मूठ दाबणे .

• तर्पण - दोन्ही हातांची ओंजळ खांद्याच्या पातळीत आणणे .

• धर्मचक्र - उजव्या हाताने ज्ञानमुद्रा व डाव्या हाताने व्याख्यान मुद्रा केली असता ही मुद्रा होते.

ध्यान किंवा समाधी पद्मासनात ताठ बसून दोन्ही तळहात मांडीवर उताणे ठेवून डोळे मिटणे.

नमस्कार - दोन्ही हात जोडून जमोनीशी लंबरूपात धरणे.

• भूस्पर्श डव्या हाताचा तळवा वर करून तो मांडीवर ठेवणे उजवा हात गुडघ्याखाली अणून तो जमिनीवर टेकविणे.

• वरद- उजवा हात पालथा करुन व बोटे परस्परांस जुळवून तो खाली वळविणे.

• व्याख्यान उजव्या हाताचा अंगठा तर्जनी यांचे कडे करून बाकीची बोटे सुटी ठेवणे.

तळहात पाहणारा समोर धरणे.

१४
[20/06, 10:18 pm] Swapnil Jirage: • ज्ञान अंगठा व तर्जनी यांची अग्रे जुळवून आणि बाकीची बोटे मोकळी सोडून तळहात हृदयाशी धरणे. १८

मुर्तिकलेतील आयुधे

देवतांच्या मानवाकृतीत आयुधांचा संयोग दाखविलेला आहे हा संयोग प्रतीकरूपाने कल्पित आहे. माणसाला आपली जीवनगाथा चालविणे आणि शत्रूपासून संरक्षण करणे यांसाठी जशी गरज असते तशी ती देवतांनाही असते देवताही आपली विशिष्ट आयुधे घेऊन दैत्य दानवांशी युद्ध करतात. पुष्कळदा आयुधांवरून मूर्तीची ओळख पटते.

• शंख प्राचीन काळी रणक्षेत्रावर वीरांना स्फुरण देण्यासाठी शंख वाजविण्याची प्रथा होती. मूर्तिकलेत शंख हे ज्ञानाचे प्रतीक मानले आहे. वामावर्त आणि दक्षिणावर्त असे दोन प्रकार आहेत. आयुधमूर्तीत शंखाची पुरुषमुर्ती दिसते. त्याचा उजवा हात व्याख्यान मुद्रा दर्शवित असून डावा हात कमलधारी आहे. वैष्णव संप्रदायात शंखाला विशेष महत्व आहे.

■ चक्र हे वैष्णव आयुध आहे ते पूर्णतेचे प्रतिक आहे. चक्राचीही मूर्ती घडविली गेली आहे. सुदर्शन चक्राच्या परीघाला चिकटून त्याची मूर्ती बनवितात.

• गदा हे प्राचीन आयुध आहे. वैदिक आर्य गदा वापरीत होते गदा आयुधदेवीच्या रूपात दाखवितात.

खड्ग लांब किंवा आखुड तलवार य रूपांना मुर्तिकलेमध्ये खड्ग म्हटले आहे. बहुतेक बहुभुज मूर्ती खड्गधारी असतात.

धनुष्य - बाण - हे अतिप्राचीन आयुध आहे. वेदकाळपूर्वीही भारतात त्याचा वापर होता. शिंगाचे व वेळुचे असे त्याचे प्रकार आहेत.

• खट्वांग हा गदेचाच एक प्रकार आहे चौपाइच्या खुरासारखा दांडा असून त्याच्या एका टोकावर माणसाची कवटी, असे त्यचे स्वरुप असते.

• अग्नी हे युद्धप्रतीक आहे.

• पाश फाससदृष्य आयुध

१५
[20/06, 10:18 pm] Swapnil Jirage: • वज्र इंद्राचे मधे मूठ व दोन्ही बाजूंस त्रिशूल असलेले आयुध.

• शूल शक्ती भाल्याचे प्रकार. १९ याशिवाय इतरही अनेक आयुधांचे प्रकार आढळतात.

अलंकरणे

मध्ययुगात मूर्तीला नखशिखांत अलंकृत करण्याची प्रथा सुरू झाली मूर्ती अलंकरणाने नटलेल्या दिसू लागल्या.

मुकुट - हे शिरोभूषण आहे याचे जटा मुकुट, किरिट मुकुट, करंड मुकुट असे तीन प्रकार पडतात.

• कर्णभूषणे यानाच कुंडलेही म्हणतात मकर कुंडल, रत्नकुंडल असे प्रकार पडतात .

• कंठभूषणे - यामध्ये हार, ग्रैवेयक, कौस्तुभ, वैजयंतीमाला, या आभूषणांचा समावेश होतो .

• बाहुभूषणे - यामध्ये कंकण, केयूर, अंगद अशी आभूषणे यात येतात.

• उदरबंध पोटावर बांधावयाचे बंधन.

• कमरबंध कमरेला बांधवयाचे बंधन.

• मेखला - कमरेला बांधावयाच्या साखळ्या.

• एकावली मोत्यांचा किंवा मण्यांचा एकपदरी सर .

कटक मनगटात घालावयाचे कंकण.

• गळसरी गळ्यात घालावयाची मण्यांची माळ .

• तांटकचक्र - वर्तुळाकार ताटलीच्या स्वरूपातील कर्णभूषण.

• फलकहार - फळाफुलांचा हार

• यज्ञोपवीत जानवे, वैकक्षक.

• श्रीवत्सचिन्ह छातीवर धारण केलेले त्रिशूल चिन्ह किंवा चौकोनी चिन्ह.

BARR. BALASAHEB KHAPDEKAR LIBRARY

SHIVAJI UNIVERSITY, KOLHAFUR.

१६
[20/06, 10:19 pm] Swapnil Jirage: अक्षमाला रुद्राक्षांची माला.

नुपूर - पायातील घुंगरु.

• तोडे हात व पायात घालावयाचे आभूषण .

२० • अंगुलियक पायातील जोडवे पादमुद्रिका.

- हिंदू धर्म -

मानव हा सहवास प्रिय प्राणी आहे. समुहाने राहणे त्याला आवडते अगदी अश्मयुगाच्या काळातही जेव्हा तो अन्न मिळविण्यासाठी भटक्याण्याच्या स्थितीमध्ये होता तेव्हाही तो टोळयांनी राहत असे. त्या अस्थिर जीवनकडून त्याने केलेली ही स्थिर जीवनाची वाटचाल आहे. याचा आढावा घेतला तर या वाटचालीला एक परंपरा आहे. सातत्य हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय आहे." मानव समुहाने व्यक्तीशः, संघषः स्वतःवर व समाजावर जे संस्कार केलेले असतात, जे विशिष्ट वळण लावून घेतलेले असतात त्यालाच संस्कृती म्हणतात "२१.

परंपरप्रियता हा हिंदू धर्मीयांच्या स्वभावातील अनन्य साधारण घटक आहे. या परंपराप्रियतेला विकासाचा क्रम मानवत नाही असे नाही. परंपरेशी ज्यांचा धागा जुळतो अशा नवीन विचारसरणी समाजाने वेळोवेळी स्विकारले आहे. " अंतःसृष्टी व बाहय सृष्टी यातील ज्या ज्या गोष्टीवर मानवाने आपल्या मानव्याची संस्कार मुद्रा ठोकली आहे. त्या सर्व गोष्टींचा कलाप म्हणजे त्याची संस्कृती. ""

भारतीय संस्कृतीचा अविष्कार घडविणाऱ्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे धर्म व

नितीमत्ता हिंन्दू धर्म हा भारतीय संस्कृतीचा सर्वात मोठा आधार स्तंभ आहे. भारतात प्राचीन

काळापासून जे निरनिराळे धर्म आणि पंथ अस्तित्वात आले, त्यांच्यात विशेष भेद नसून ते

सर्व सत्याच्या अंतिम साक्षात्काराकडे नेणारे निरनिराळे मार्ग आहेत असे दिसून येते. शिव

विष्णू आदी देवांची मंदिरे भारतात कोठेही गेले तरी आढळून येतात. सर्वच हिंन्दू गाईला

पवित्र मानतात. आत्म्याचे अमरत्व पुनर्जन्म, मोक्ष, निर्वाण, कर्म या सर्व कल्पना भारतातल्या

बहुतांश धर्मात आढळून येतात. भारतात त्या सर्व धर्माच्या मुळाशी असणारा प्रवाह

१७
[20/06, 10:19 pm] Swapnil Jirage: भारतातील धर्माची एकात्मता टिकवून ठेवतो असे दिसून येते भारतात राहणाऱ्या विविध जमातीमध्ये जी संस्कृती आणि सभ्यता आलेली आहे. ती जगाच्या सर्व संस्कृतीमध्ये वैशिष्टयपूर्ण ठरली आहे. भारतातल्या निरनिराळया सामाजिक आणि धार्मिक चालीरिती यातून सांस्कृतिक एकात्मताच दिसून येते.

प्राचीन भारतीय परंपरेत धर्म ही संज्ञा विशिष्ठ अर्थाने वापरली जाते. संस्कृत मधील 'धृ' या मुळ धातूपासून धर्म ही संज्ञा बनलेली आहे. 'धृ' म्हणजे धारण करणे. या धातुपासून धर्म हा शब्द बनला आहे. समाजाची धारणा करणारा तो धर्म असा या संज्ञेला अर्थ आहे. ऋग्वेदात आधार देणे, पालनपोषण करणे, आचार या अर्थाने धर्म ही संज्ञा वापरलेली आहे. समाजाचे व्यवस्थितपणे नियमन करण्यासाठी तसेच समाजाला योग्य अशा आदर्श मार्गाने मार्गदर्शन करण्यासाठी प्रचलीत असलेल्या नियमांना धर्म ही संज्ञा दिली आहे. मानवाच्या जोवनाचे तसेच मानव समुहातून बनणाऱ्या समाजाचे नियमन करण्याचे काम धर्म करतो. धर्म या संज्ञेत कोणत्याही आचारांचा किंवा धार्मिक विधींचा समावेश असत नाही. ही मूलभूत स्वरुपाच्या तत्वांवर आधारलेली संकल्पना आहे. ही मूलभूत स्वरुपाच्या तत्वांवर आधारलेली संकल्पना आहे. नैतिक नियमांचे पालन करण्याच्या हेतून तसेच मानवी जीवनातील अंतिम उदिष्ट साध्य करण्यासाठी या तत्वात काही आचारांची विधींची जोड दिलेली आहे. मात्र आचार किंवा विधी हे धर्म संकल्पनेचे बाहयांग असून मूळ नैतिक तत्वांचाच धर्म संज्ञेच्या अंतर्भागात समावेश होतो. धर्मांची संकल्पना ही कोणत्याही काळात किंवा कोणत्याही देशात साचेबंद असत नाही या उलट काळाच्या गतीनुसार या संकल्पनेतही प्रगमनशिलता निर्माण होते. या प्रगमन शिलतेच्या वैशिष्ठयामुळेच कोणत्याही कालखंडात बदलत्या सामाजिक स्थितीतही समाजाचे यथार्थ मार्गदर्शन करण्याचे काम धर्म करतो, म्हणूनच निरनिराळया कालखंडात धर्म या संकल्पनेच्या द्वारे समाजाची धारणा केली

जात असून धर्माच्या विचारावर समाजात गतिशिलता निर्माण केली जाते.

प्राचीन भारतात इतर कोणत्याही देशापेक्षा दीर्घकालीन धार्मिक आक्रमणे झालेली असतानाही संस्कृतीचे सातत्य खंडीत झालेले नाही. सहिष्णूतेच्या व समन्वयवादी दृष्टीच्या या संस्कृतीच्या वैशिष्ठयामुळेच हे सातत्य कायम टिकलेले असते. त्यामुळे निरनिराळया ऐतिहासिक कालखंडात धार्मिक आचार व विधीचे स्वरुप बदलत गेले असले तरी या संस्कृतीचा धार्मिक विचाराचा मूळ अध्यात्मिक गाभा कायमच राहिला आहे. निरनिराळया कालखंडातील धर्माच्या स्वरुपाची आचार विचारांची देवदेवतांची ऐहिक जीवन विषयक विचारांची व तत्व -

ज्ञानाची माहिती घेणे आवश्यक ठरते.

धर्माधिष्ठित भारतीय संस्कृती श्रेष्ठ पदाला नेण्याचे श्रेय थोरलोकांच्या महान परंपरेकडे जाते. या परंपरेत प्राचीन तमकाळातील श्रेष्ठ पदाला गेलेल्या ऋषीमुनींच्या तपस्व्यांचा, विद्वानांचा समावेश होतो. हे प्रणेते भारतीय संस्कृतीच्या शलाका आहेत. असे असले तरी या पूर्वीही एक अज्ञात संस्कृती होती, ती म्हणजे सिंधू संस्कृती या संस्कृतीतील लोक निश्चित कोणत्या धर्माचे होते हे सांगता येत नाही. त्यांचे धार्मिक तत्वज्ञ गान सांगणारा एकही ग्रंथ सापडलेला नाही. उत्खननात सापडलेल्या मुर्तीवरुन त्या लोकांच्या

१८
[20/06, 10:19 pm] Swapnil Jirage: धार्मिक कल्पना विषयी काही अनुमान काढता येतात. मोहोंजदडोच्या अवशेषात एक शिवाची त्रिमुखी मूर्ती सापडली आहे. यावरुन हे लोक शिवाची भक्ती करीत असावेत.

सिंधू संस्कृतीनंतर जी संस्कृती उदयाला आली आणि उत्कर्षाप्रत पोहोचली तिला वैदिक संस्कृती असे नाव मिळाले. वैदिक संस्कृतीतील धर्म अत्यंत साधा होता. यातील देवतांमध्ये प्रामुख्याने इंद्र दिसतो. तसेच अग्नी, वरुण, पर्जन्य, उषस, आश्विन इत्यादी देव दिसतात. ऋग्वेदात आर्याच्या टोळयांचे उल्लेख मिळतात. सप्त सिंधूच्या प्रदेशात वास्तव्य करीत असतानाच आर्यांनी ऋग्वेदाची निर्मिती केली. ऋग्वेदात अंतर्भूत असलेल्या माहितीवरुन त्यांच्या धार्मिक जीवनावर प्रकाश टाकता येतो. ऋग्वेद कालीन समाजाचा जीवन विषयक दृष्टीकोन प्रवृत्तीवादी होता. प्रवृत्तीवादी दृष्टीकोनातूनच देवदेवतांची प्रार्थना केलेली दिसते. ऋऋग्वेदातील धर्म हा निसर्गाधिष्ठीत होता. भोवतीच्या निसर्गात जाणवणाऱ्या वैचित्र्यामागे कोणतीतरी शक्ती असावी किंवा चैतन्य तत्व असावे असे मानलेले होते. या निसर्गातील चैतन्यशक्तींना किंवा निसर्गातील विविध तत्वांनाच देवदेवता मानण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऋग्वेद कालीन धर्मात मूर्ती पूजेचे अस्तित्व आढळत नाही.

उत्तर वैदिक लोकांच्या जीवनात आणि धार्मिक कल्पनात मोठे बदल घडून आले. या काळातील आचारधर्म, तत्वज्ञान विषयक विचार आणि ईश्वर विषयक यात बदल झाला. वेदकाळाच्या प्रारंभीचे सहज सुलभ व निसर्गाधिष्ठित धार्मिक जीवन नष्ट होऊन धर्माला आचाराधिष्ठीत कर्मकांडाचे स्वरुप मिळाले. उत्तर वैदिक काळानंतर पुराणांच्या काळात वैदिक काळातील देव देवतांचे महत्व कमी होवून, ब्रम्हा, विष्णू, महेश, गणेश इत्यादी नवीन देवदेवतांचा उदय झाला.

मौर्य काळात वैदिक धर्माची बरीच पिछेहाट झाली होती. इंद्र, वरुण, गणेश यांची उपासना चालू होतीच, त्यातच विष्णू, शिव, सूर्य यांच्या पूजेची भर पडली. मौर्योत्तर काळात वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाची एक मोठी लाटच निर्माण झाली. गुप्त काळात या चळवळीचा बराच विकास झाला. गुप्तांनी जुन्या यज्ञ परंपरेला चालना देण्याचा प्रयत्न केला. अनेक राजांनी यज्ञ केलेही परंतु बहुजन समजात त्याला लोकप्रियता लाभली नाही. वैदिक देवता लुप्तप्राय

झाल्या व नवीन स्वरुपात रुपांतरीत झाल्या. ब्रम्हा, विष्णू, महेश या देवतांना प्राधान्य प्राप्त झाले. यज्ञाची जागा मूर्तीपूजेनी घेतली सर्वच पंथात मूर्तीपूजा अतिशय लोकप्रिय झाली त्यातूनच भागवत धर्माचा उदय झाला. अनेक राजे स्वतःला " परमभागवत" व " परमवैष्णव" म्हणवून घेत. २५ याच काळात शैव व वैष्णव पंथाची वाढ झाली. वैष्णव पंथाला राजमान्यता मिळाली. गुप्तसम्राटांनी हिंदू धर्माला आश्रय दिल्यामुळे मूर्तीपूजेला उत्तेजन मिळाले. मोठ्या प्रमाणात विष्णूची, शिवाची मंदिरे बांधली गेली. अवतार कल्पनेचा

विकास होवून विष्णूच्या अनेक अवतारांची पूजा सुरु झाली. वैष्णव पंथ

पुराणोक्त धर्मानुसार भक्ती, व्रतवैकल्ये, पूजा, तिर्थ यात्रा यांना महत्वाचे स्थान मिळाले. भक्ती म्हणजे सगूण निर्गुण देवदेवतांचे अस्तित्व मानले जाते. भक्तीपंथाची सुरवात निश्चित केव्हा झाली हे सांगता येत नाही पुराण काळात निर्गुण उपासनेबरोबरच सगुण उपासनेला महत्व मिळाले. काही पुराणांनी विष्णूला तर काही पुराणांनी शक्तीला

१९

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...