Monday, June 10, 2024

मुर्तीशास्त्र पुस्तक बॅक अप

 १. भारतीय कलेची पहाट

चित्र क्र. ३: स्व. हरिभाऊ वाकणकर

    कलेची सुरुवात कुठे झाली असे पाहायला गेल्यास लक्षात येते की, अन्य वनचरांप्रमाणे मानवही मिळेल ते खात होता. एवढेच नाही तर इतर सर्व प्राण्यांमध्ये तो शिकारीच्या दृष्टीने निर्बुद्ध आणि अकुशल होता. इतर प्राण्यांनी मारून खाऊन टाकलेले तो खात होता. किती शतके अशी गेली हे ठाऊक नाही. परंतु अनुभवाने त्याचा विकास झालेला दिसतो. कठोर कवचाच्या फळांना चिकटलेला गर हा अन्य दगडाने किंवा लाकडाच्या कपचीने खरडून काढता येतो असे त्याच्या लक्षात आले. आपल्याला हव्या असणाऱ्या आकाराच्या कपच्या उपलब्ध नसल्यास एका दगडावर दुसऱ्या दगडाने प्रहार करून मनाजोगता आकार देता येतो हे त्याला उमगले. पुढे पुढे आघात करायला कोणता दगड घ्यावा आणि आकार द्यायला, घडवायला कोणता दगड घ्यावा तसेच यांच्यातला टणकपणा वेगळा असतो ह्याचेही त्याला ज्ञान झाले. ज्या दिवशी पहिल्यांदा एक दगड उचलून त्याने दुसऱ्या दगडावर घाव घालायचा प्रयत्न केला असेल त्या दिवशी जगातला पहिला कलाकार जन्माला आला. जगामध्ये अनेक मानव समूहांमध्ये अशीच सुरुवात झाली असणार. परंतु असे आढळले आहे की, भारतामध्ये आढळलेल्या या कलेचे नैपुण्यही थोडे उजवेच होते असे म्हणावे लागेल. पाषाण युगातील आफ्रिका खंडात सापडणाऱ्या दगडी हत्यारांपेक्षा समकालीन भारतात सापडलेली हत्यारे ही कित्येक पटीने रेखीव आणि धाटणीमध्ये उत्कृष्ट अशी आढळलेली आहेत.
 असाच एक मानव समूह स्थलांतर करीत करीत (आजच्या मध्य प्रदेश या प्रांतात ) नर्मदा नदीपासून दूर थोड्या उंच अशा डोंगराळ प्रदेशात पोहोचला. इथले वातावरण अत्यंत वेगळे होते.प्रचंड अशा वालुकापाषाणाच्या शिळांमध्ये नैसर्गिकरीत्या मोठ्या खोबणी तयार झालेल्या त्यांना आढळल्या. एक आयता आडोसा आणि तोही इतका भक्कम त्यामुळे त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. हेच या विशेष समूहांबाबत जे घडले ते जगामध्ये आदिम काळात अन्यत्र कधी घडले नव्हते ओणि त्यानंतरही तसे कुठेही घडले नाही. अश्मयुगात साधारणतः काही दशके किंवा एक दोन शतके एवढ्यास ३ कालखंडात एखादी वस्ती केल्याचे आढळून येते. फार तर क्वचित प्रसंगी एक दोन सहस्रके. इथे मात्र सलग एक लाख वर्षांहून अधिक काळापर्यंत वस्ती असल्याचे अवशेष सापडलेले आहेत. होत.
     खरं तर हेही एवढे जुने आहे आणि तेही भारतात याच्यावर आधुनिक काळात कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते. १८६८ मध्ये किंकेड नावाचा इंग्रज अधिकारी सर्वेक्षणाच्या निमित्ताने तिथे गेला. त्याने तिथल्या भिंतींवरील असणाऱ्या काही चित्रांचीही नोंद केली, परंतु तसल्याच प्रकारच्या चित्राकृती त्याला जवळपासच्या वनात राहणाऱ्यांच्या घरावर पण दिसल्या असाव्यात. यामुळे याच मंडळींनी गुरे चारता चारता डोंगरावरील गुफांमध्येही त्या चितारल्या असाव्यात असा समज त्याने करून घेतला. त्यातील काही आकृत्यांमध्ये गेंड्याच्या शिकारीचे चित्र होते, ते पाहून विसाव्या शतकाच्या पूर्वाधात होऊन गेलेल्या गार्डन नावाच्या संशोधकाने त्या चित्रांचा काळ केवळ तीनशे वर्षांपूर्वीचा असावा असे ठोकून दिले. त्याचे समर्थन करण्यासाठी बाबरला गेंड्याच्या शिकारीचा नाद होता, त्यामुळे ही चित्रकला बाबरच्या काळातील असावी असा जावई शोधही त्याने लावून टाकला.
      १९५८ मध्ये एक प्रवासी घाईघाईने भोपाळच्या रेल्वेस्थानकावर गाडी पकडण्यासाठी आला. त्याला नागपूरला जायचे होते. गाडी सुटल्यावर सुमारे पाऊण तासाने त्याने खिडकीबाहेर पाहिले तेव्हा त्याला एका डोंगरावर बेड्यावाकड्या आकारांच्या काही प्रचंड शिळा दिसल्या. कुतूहलापोटी त्याने सहप्रवाशाला विचारले, की हे काय आहे. त्यावर तो उत्तरला माहीत नाही नक्की काय आहे ते, परंतु तेथे काही खूप प्राचीन काळातल्या गुहा आहेत असे म्हणतात. गाडी वेगाने पुढे धावत होती आणि ह्या प्रवाशाची नजर दूरदूर जाणाऱ्या त्या शिळांवरून हालत नव्हती. त्याने पुन्हा शेजाऱ्याला विचारले की. पुढील स्टेशन कधी येईल त्यावर त्याने होशंगाबादपर्यंत गाडी कुठेही थांबणार नसल्याचे सांगितले.दहाच मिनिटांनी काही सहप्रवासी आपले सामान उचलून दाराकडे चालू लागले.
"अरे, तुम्ही तर म्हणालात की गाडी मध्ये थांबत नाही."
"हो ! ते खरं आहे. पण आमचे गाव इथेच जवळ आहे."
"पण तुम्ही उतरणार कसे?"
"काही नाही, पुढील स्थानकाच्या अलीकडे एक मोठे वळण असल्यामुळे गाडीचा वेग थोडा मंदावतो आणि आम्ही त्याच वेळेस पटापट उड्या मारतो. आम्हाला हे रोजचेच आहे."
   याही प्रवाशाने घाईघाईने आपले सामान गोळा केले व त्यांच्या मागे जाऊन उभा राहिला. वळणावर गाडी हळू होताच त्यांच्या पाठोपाठ यानेही सामानासकट चालत्या गाडीतून स्वतःला झोकून दिले. सवयीचे नसल्यामुळे खाली पडताना अंग भरपूर खरचटले. त्याच अवस्थेत त्याने जवळच असणारे बरखेडा स्थानक गाठले. तिथून नागपूरला आपण येऊ शकत नाही अशी तार करून टाकली आणि त्या डोंगरावरील शिळांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. १५ ते २० मैलांचा तो प्रवास त्याने जंगलातून आणि काट्याकुट्यातून वाट काढत काढत केला आणि उन्हे उतरत असताना तो तिथे पोहोचला. अत्यंत निर्मनुष्य आणि घनदाट अरण्यात असणाऱ्या त्या शिळांखालील एका गुहेत एक साधू राहत असल्याचे त्याला दिसले. त्याने त्यास विचारले, "इस जगह का नाम क्या है ?"
साधू म्हणाला, "भीमबेटका."
"ऐसा क्यूं ?"
"ऐसा माना जाता है, इन शिलाऑपर भीम बैठा करता था। ये तो मानो कि भीम की बैठक है।"
    त्या प्रवाशाने घरून आणलेला डबा साधूबरोबर संपवून रात्री तिथेच मुक्काम केला. सकाळी त्या जंगलातून वाट काढत शिळांमधील अन्य गुहांचा शोध घेतला. त्यात अनेक ठिकाणी भिंतीवर असंख्य चित्रे काढलेली दिसली. भारतीय चित्रकलेतल्या प्राचीनत्वाचा शोध घेण्याचा तो सोनियाचा दिवस उजाडला होता. त्या संशोधकाचे नाव आहे, विष्णू श्रीधर उपाख्य हरिभाऊ वाकणकर.

चित्र क्र. ४ : भीमबेटका येथील चित्रकला

     पुढील पंधरा वर्षे एकट्याने अभ्यास करून आणि त्यावेळेस महिना केवळ चारशे रुपये असूनही शनिवार, रविवार आणि अन्य सुट्यांच्या दिवशी उज्जैन ते भोपाळ ते भीमबेटका असा प्रवास करून अविरत संशोधन सुरू ठेवले. ह्या संपूर्ण काळात हरिभाऊंची टिंगल आणि उपेक्षा त्यांच्या विक्रम विश्व विद्यालयातील सहकाऱ्यांनी केली. परंतु त्यांच्या अढळ विश्वासाने चालणाऱ्या या शोधयज्ञाची सांगता अखेर त्या चित्रांची प्राचीनता सिद्ध करूनच झाली. गॉर्डनच्या तर्क विसंगत विधानांचे समूह उच्चाटन केले गेले आणि बाबरचा काळ तर सोडाच पण यातील काही चित्रे ही सुमारे दहा हजार वर्षापूर्ण काढली गेली असावीत ह्या हरिभाऊंच्या शास्त्रशुद्ध निकषाला जगाने आज मान्यता दिली आहे.
    हरिभाऊंच्या ह्या शोधामागे शास्त्रीय पुरावे, उत्खननातील पुरावे आणि इतर अनेक निकषांची हो जरी दिली गेली असली तरी खरा शोध हरिभाऊंनी लावला तो त्या आदिम काळातील आहे चित्रकारांच्या भावविश्वामध्ये प्रवेश करूनच. आपल्या भावभावनांचा आणि भोवतालच वातावरणाचा अत्यंत कल्पक आविष्कार त्या वेळच्या चित्रकारांनी आपल्याला इथल्या रेखाचित्रांमध केलेला दिसतो. अत्यंत ओबडधोबड अशा चित्रफलकावर (कॅनव्हासवर) तितक्याच ओबडधोब कुंचल्याने तो एकदाच टेकवून रेष पूर्ण करण्याच्या अटीवर साकारलेली ही अचाट चित्रकला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि तुटपुंजी आणि अपूर्ण साधने असून सुद्धा भावनात्मक गतिमानतेर साक्षात्कार घडवत जाण्याची ही प्रेरणा पुढील काळामध्ये भारतीय कलांची जणू ओळखच होऊन गेलं आहे. भारतीय कलांचे 'भीमबेटका' हे जणू तीर्थक्षेत्रच आहे.
    भीमबेटका येथील चित्रांची प्राचीनता ठरविण्यासाठी त्या चित्रांच्या शैलींनुसार त्याचे पृथक्करण हरिभाऊंना करावेसे वाटले. ते स्वतःही उत्तम चित्रकार असल्यामुळे त्यांना त्यातील आधीच्या आरि नंतर विकसित होत गेलेल्या शैलीतील फरक कळला. भित्तीचित्रांच्या शैलींवरून त्यांची प्राचीनत आणि कालखंड ठरविण्याची ही अभिनव पद्धत हरिभाऊ वाकणकरांनी जगाला आणि पुरातत्त्वाला दिलेली एक देणगीच आहे.

स्पष्ट तरीही गूढ इतिहास

    भीमबेटकामध्ये जरी दहा हजार वर्षांपासून ते सुमारे तीन हजार वर्षांपर्यंतच्या कालखंडात कलेमधला इतिहास सलगपणे दिसत असला तरीही, आपल्या देशातील अन्य कलांचा इतिहास तसा आढळत नाही. इ.स. पूर्व ५००० ते इ.स. पूर्व २००० या कालखंडातील अत्यंत प्रगत संस्कृतीच्या खुणा आणि अवशेष आपल्याला आढळतात. आधुनिक काळातील फर्माना, राखीगढी, खंबात य सारख्या स्थानांवरील उत्खननांमुळे हा कालखंड याच्याही तीन एक हजार वर्षे तरी मागे जातो. परंतु या  सरस्वती-सिंधू संस्कृतीच्या पुराव्यांमध्ये त्यांच्या लिपीचे वाचन न होऊ शकल्यामुळे त्यालाही प्रागैतिहासिक काल असेच संबोधले जाते. या अवशेषांमध्ये मात्र अन्य कलांच्याबरोबरच शिल्पकलेचेही पुरावे मिळतात. या मध्ये घडवलेल्या दगडांच्या विविध आकारांपासून (Lathe-turned stones) ते पाषाण आणि धातू शिल्पित केलेली दिसतात. यातील प्रसिद्ध शिल्पे धोलाविरा (इ.स. पूर्व ३५००) येथील शिवलिंगासारखे लंबवर्तुळाकार दगड आणि सिंधू संस्कृतीतील (इ.स.पूर्व ३००० ते इ. स. पूर्व २०००) मोहेंजोदरो आणि हडप्पा येथे सापडलेली पाषाण शिल्पे आणि एका नर्तकीचे धातू शिल्प ही होत. पाषाण शिल्पामध्ये एक दाढीवाल्या पुरुषाचे अर्धशिल्प (Bust) सापडले आहे. त्याचा चेहरा तर अत्यंक सुबकपणे कोरलेला आहे, त्याचबरोबर त्याच्या खांद्यावरील शालीवरील नक्षीचा तपशीलही ठळकपणे दिसतो त्यावरून तो एक ज्येष्ठ पुजारी असावा किंवा धर्मगुरू असावा असा तर्क आहे. धातू शिल्पातील नर्तकी ही शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ, जाड ओठांची आणि विवस्त्र आहे. यामुळे अतिशय विकसित कलेच्या अवस्थेत असलेल्या या कलाकृतींचा हेतू मात्र स्पष्ट होत नाही. याच कालखंडातील अनेक आकारांची मातीची भांडी, रांजणे इ. अत्यंत उत्कृष्टपणे रंगवलेली आढळतात. याचा अर्थ त्या काळातील प्रयोगसिद्ध कला (Performing Art) आणि उपयुक्त कला (Applied Art) या एकाच वेळेस अत्यंत प्रगत आणि समृद्ध होत्या. तरीही त्यांचा हेतू हा नंतरच्या विकसित झालेल्या कलांशी साधर्म्य ठेवणारा नसल्यासारखा वाटतो. एकूणच आपल्या इतिहासातील हा कालखंड आणि त्या दरम्यान विकसित झालेल्या कल्पना, नगर रचना आणि समृद्धीच्या पाऊलखुणा या एका क्षणभर प्रदीप्त होणाऱ्या अग्निगोलाप्रमाणे आहेत. या संस्कृतीला समकालीन असणाऱ्या जगातील अन्य देशातील संस्कृती सुद्धा अशाच आणि इतक्याच प्रगत होत्या, सुमेरियन, इजिप्तियन आदी. परंतु त्याही तशाच क्षणभर चमकून नाहीशा झाल्या. सरस्वती आणि सिंधू नदीच्या खोऱ्यापासून पंजाब ते गुजरात आणि महाराष्ट्राचे उत्तर टोकापर्यंत पसरलेल्या या संस्कृतीचाही लोप झाला. हा भूप्रदेश भारतात असल्यामुळे आपण त्याला आपली संस्कृती असे मानतो. काही अभ्यासकांनी तर त्यात सापडलेल्या (Seals) मुद्रांवरील लिपी वाचताना त्या ऋग्वेदाच्याच ऋचा आहेत असेही म्हटले आहे. एका मुद्रेवरील प्राण्यांमध्ये बसलेल्या मानवी आकृतीला पशुपतिनाथही म्हटले आहे. खरे काय ते अजून अज्ञातच आहे. परंतु या कलांच्या काही शतकांनंतर विकसित झालेल्या हिंदू शिल्पकलेशी या परंपरेचा थेट संपर्क असावा असे मात्र दिसत नाही.

वेदकालीन कला

वेद काळ म्हटला की सामान्य भारतीयाला आपला सर्वात प्राचीन काळ वाटायला लागतो. याचे कारण असे की त्या परंपरेत निर्माण झालेले ज्ञान, वाङ्मय, पूजापद्धती, धार्मिक विधी या सर्वांचा आजच्याही जीवनामध्ये कुठेना कुठे प्रभाव असलेला दिसतो. याचा फायदा घेऊन इंग्रजांनी सरस्वत सिंधू संस्कृतीपेक्षा वेद हे नंतरचे म्हणजे इ.स. पूर्व १५०० किंवा त्यानंतरचे असे सिद्ध करायचा प्रय केला. त्यामधून वेदांचा नक्की काळ काय याचा मोठा संभ्रम उत्पन्न करून ठेवला.

पाश्चात्त्यांचे चमत्कारिक निकष

  आधुनिक पुरातत्त्व शास्त्राप्रमाणे ज्या संस्कृतीची लिपी वाचता येते त्या कालखंडापासून तर संस्कृतीचा इतिहास सुरू झाला असे समजून त्याला ऐतिहासिक काळ असे म्हटले जाते. इजिप्तमधील लिपी ही चित्रलिपी असून सुद्धा ती वाचता आल्यामुळे इजिप्तचा इतिहास हा ५००० वर्षे जुना ठाले गम्मत म्हणजे ती विकसित संस्कृती असणारा तो समाज ३००० वर्षांपूर्वीच नामशेष झाला आणि तो भाग गेली २००० वर्ष चोर, लुटारू आणि भुरटे अशांच्या ताब्यात राहिला ज्यांचा त्या प्राचीन संस्कृतीशी कोणताही संबंध नाही. तरीही इजिप्तचा इतिहास म्हटला की तो ५००० वर्षांपूर्वीचा असे छातीठोक विधान केले जाते. याचे कारण त्या अवशेषांमधील लिपीचे म्हणजे क्युनिफॉर्म लिपीचे वाचन करत आले आहे. वर चित्रलिपी आणि त्याच्या खाली ग्रीक लिपीतील शिलालेख कोरलेला एक दगड तिथे आढळला. या दगडाला 'रोझेटा स्टोन' असे नाव आहे. त्यावरील ग्रीक लिपी वाचता येत असल्यामुळे त्यावरून क्युनिफॉर्म ही चित्र लिपीही वाचता आली. सरस्वती सिंधू संस्कृतीतील लिपी अद्याप वाचली गेलेली नाही. सरस्वती सिंधू संस्कृतीतील असा द्वयभाषिक पुरावा न सापडल्यामुळे तिस वाचन होऊ शकलेले नाही. भारताची वाचली गेलेली सगळ्यात जुनी लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी. ज्याचे सर्वात जुने पुरावे म्हणजे सम्राट अशोकाचे शिलालेख. या शिलालेखावरून सम्राट अशोकाचा काळ  इ.स.पूर्व २७३ ते इ.स.२३६ असा निश्चित केला गेला. त्यामुळे भारताची प्राचीन संस्कृती असल्याचे मान्य करूनसुद्धा भारताचा ऐतिहासिक काळ हा इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातच सुरू झाला अशी मान्यता आहे. यामध्ये वेद वाड्मयांनी मोठी धमाल उडवून दिली. एक तर ते लिखित नव्हते असा ग्रह आहे. त्यामुळे लिपीचा प्रश्न नाही. लिपी जरी नसली तरी मुखोद्रत पद्धतीने का होईना संपूर्ण वाड्मय उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या वाड्मयाच्या काळापासून ह्या इतिहासाची सुरुवात झाली असे पाश्चात्त्यांच्याच निकषांप्रमाणे मानले तर भारताचा इतिहास हा वेद काळापासूनचा हे मान्य करणे प्रात होते. यावर इंग्रजांनी आणखी एक युक्ती शोधली. मॅक्सम्युलर नावाच्या एका जर्मन विद्वानाला १८७० हे १८८० च्या दशकात वेदांचा काळ ठरविण्याचे काम दिले. त्या आग्रहाला बळी पडून त्या श्रेष्ठ विद्वानाने वेदांचा काळ हा इ.स. पूर्व २५०० ते १५०० असा तर निश्चित केलाच परंतु त्याच बरोबर सिंधू द्रविड संस्कृतीवर बाहेरून आलेल्या आर्यांनी आक्रमण करून त्यांना पार दक्षिणेकडे हाकलून लावले असता जावई शोधसुद्धा लावला. सुरुवातीच्या काळात भारताच्या सर्व भागातील विद्वानांनी याला प्रचंड विरोध केला. इंग्रजांनी तो दडपून टाकला. लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या दोन ग्रंथांमुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारताच्या विद्वानांनी मॅक्सम्युलरचे हे म्हणणे मान्य केले आणि इंग्रजांविरुद्ध आपला वैचारिक पराभव स्वीकारला, त्याबरोबरच आर्य बाहेरून आले हे एक अनैतिहासिक सत्यदेखील अकारण प्रस्थापित झाले.
      ऋग्वेदामधील ऋचांमध्ये अनेक विषयांचा समावेश आहे. ज्यामध्ये तत्कालीन घटनांचा परामर्श घेतलेला आहे. सर्व काही पाठ करून ठेवण्याची पद्धत असल्यामुळे कुठलेही पाल्हाळ न लावता कमीत कमी शब्दांमध्ये त्याची रचना करणे आवश्यक होते. त्यामुळे त्यातील काही ऐतिहासिक घटनांचे वर्णन दोन दोन शब्दातच केलेले दिसते. ऋग्वेदांमधील दुसऱ्या मंडलातील अकरावे सूक्त गृत्समद-शौनकाचे
आहे. यातील प्रत्येक ऋचेच्या शेवटी 'जनास इंद्रः' असे शब्द येतात. म्हणूनच याला इंद्राचे पालुपद सूक्त असेही म्हणतात. शेवटल्या पालुपदाचा अर्थ "अरे अमुक अमुक करणारा तो इंद्र असा आहे" असा होतो. या सूक्तांमध्ये गृत्समद ऋषी एका ऐतिहासिक सत्याचा उल्लेख करून जातात. याची पार्श्वभूमी अशी आहे की, इंद्र हा वैदिक काळातील लोकांचा म्हणजेच आर्यांच्या सेनेचा सेनापती होता. तो ज्यांच्याकडून लढायचा त्यांना युद्धामध्ये विजय प्राप्त व्हावयाचा. त्याच्या रणांगणावरील असामान्य शौर्यामुळे इंद्राच्या काही दुर्गुणांकडे नुसता कानाडोळा केला जायचा एवढेच नाही त्याचा अनुचित लाभही घेतला जायचा. त्यामुळे अनेकदा शत्रुपक्षाचे लोक त्याचे अपहरण करून त्याला घेऊन जात, सोमरस पाजून तृप्त करत आणि त्यांच्या बाजूने लढण्यास उद्युक्त करत. अशाच एका सैन्याचा तो सेनापती होता की ज्या गावामध्ये गृत्समद ऋषी राहत होते. इंद्राचे अपहरण करायला रात्री शत्रू सैन्याचे लोक आले. तेव्हा गृत्समद ऋषींनी इंद्राची वस्त्र प्रावरणे आणि त्याचीच युद्धावर जाताना घालायची रक्षक वस्त्रे धारण केली. अपहरण करायला आलेल्या शत्रू सैन्यातील लोकांना तोच इंद्र वाटला आणि त्यांनी वेषांतर केलेल्या गृत्समद ऋषींना इंद्र समजून पकडून नेले. गृत्समद ऋषींचा बेत यशस्वी झाला आणि खरा इंद्र गावातच राहिला. शत्रूच्या छावणीच्या अगदी जवळ आल्यावर गृत्समद ऋर्षीनी बोलायला सुरुवात केली आणि त्या वेळेस त्यांनी जे त्या लोकांना सांगितले ते म्हणजे या अकराव्या सूक्तातील ऋचा आहेत. त्यात त्यांनी इंद्राचे वर्णन करताना त्याचे अनेक गुणविशेष सांगितले. प्रत्येक ऋचेमध्ये ते इंद्राचे वर्णन करावयाचे आणि शेवटी म्हणायचे 'स जनास इंद्र:' या वर्णनांमुळे इंद्रासंबंधीची बरीच माहिती मिळते. तो उंचापुरा, धिप्पाड तरीही अतिचपळ होता. त्याचे केस, दाढी इतकेच काय भुवयाही सोनेरी होत्या. हे सगळे वर्णन करताना गृत्समद ऋषी या सैनिकांना सांगत होते की अशा गुणांनी संपन्न असलेला जो आहे असा 'स जनास इंद्रः' अरे, तो इंद्र या नावाने ओळखला जातो. थोडक्यात काय की ते असे सांगायचा प्रयत्न करत होते की तो मी नव्हेच. तुम्ही मला कशाला धरून आणले आहे. या सूक्ताच्या तिसऱ्या ऋचेमध्ये ते असे म्हणतात,
 'यो हत्वाहिमरिणातसप्तसिंधून्यो गा उदाजदयधावलस्य ।
यो आश्मनोरंतरग्नि जजान सवृक्समत्स् स जनास इंद्रः । (ऋग्वेद २.१२.३, अथर्ववेद २०.३४.३ )
      याचा अर्थ असा होतो की, हे लोकांनो, अहिचा वध करून सप्तसिंधूंना विमुक्त करणारा, वलाच कैदखान्यातील धेनूंना बंधमुक्त करणारा, मेघातून अग्नी उत्पन्न करणारा, तसेच युद्धात शत्रुसंहार करणारा इंद्र हा असा आहे. यामध्ये उल्लेखलेल्या सात नद्यांमध्ये (सप्तसिंधून्यो) सरस्वती ही एक नदी हो पंजाबातील आजच्या पाच नद्या आणि सिंधू नदी या उर्वरीत सहा नद्या आहेत.
    तसेच ऋग्वेदातील अनेक ऋचांमध्ये (क्र. ४.११.३, ८.९३.१, १०.४३.३ आणि १०.४९. आणि या इंद्राच्या सूक्तांमध्ये सप्त नद्यांना प्रवाही केल्याचा स्पष्ट उल्लेख येतो. इंद्र अडलेले नद्यांचे पाणी प्रवाही करतो असा उल्लेख येतो. ऐतिहासिक दृष्ट्या या घटना म्हणजे इंद्र त्या आटत चाललेल नद्यांच्या प्रवाहांना डोंगरात जाऊन स्फोटकांच्या साहाय्याने दगड फोडून मोकळे करत होत पंजाबातील पाच नद्या, सिंधू आणि सरस्वती ह्या त्या उल्लेखिलेल्या सप्त सिंधू आहेत. यातील पहिल्य पाच नद्या आणि सिंधू नदी आजही प्रवाही आहेत. परंतु सरस्वती नदी मात्र आटून गेली. भूगोलातील पुराव्यानुसार हा कालखंड इ.स.पू. २२०० असा आहे. या सरस्वती नदीचे पात्र हे अधिकाधिक २० किलोमीटर (हिमाचल प्रदेशात) आणि कमीतकमी ८ किलोमीटर (राजस्थानात) एवढे होते. हा सर्व प्रवाह अचानक एका रात्रीत आटू शकत नाही. तो हळूहळू क्षीण होत जातो. याचा कालावधीसुद्धा अनेक शतकांचा असतो, किमान १००० वर्षांचा तरी नक्कीच. याचा अर्थ असा की इ.स. पूर्व २२०० मध्ये आटलेल्या नदीचा क्षीण होणारा प्रवाह गृत्समद ऋषींनी त्याच्या किमान १००० वर्षांपूर्वी (किंवा त्याहूनही अधिक वर्षे) नक्की पाहिला असणार. सरस्वती नदीचा उल्लेख ऋग्वेदामध्ये ६५ वेळा येतो एवढेच नाही तर तिचे वर्णन त्यांनी नदीतमे अम्बितमे देवीतमे सरस्वती, म्हणजे महान नदी, महान माता आणि महान देवी असे केले आहे. गृत्समद ऋर्षीनी पूर्ण रूपाने प्रवाहित असणाऱ्या सरस्वतीला नक्कीच पाहिले असणार. तो काळ गृत्समद ऋषींपेक्षा १००० वर्षे जुना असू शकतो. म्हणजे इ.स. पूर्व ५००० ते ४००० वर्षे, वैज्ञानिक सत्याच्या आधारावर ऋग्वेदाचा काळ हा इ.स. पूर्व १५०० च्या खूपच मारे जातो. या सत्याचा स्वीकार आता जगाने केला आहे.

  २. भारतीय शिल्पकलेची सुरुवात

चित्र क्र. ५: पुरोहित, मोहनजोदारो

भौगोलिक घटनांच्या आधारे एक गोष्ट मात्र नक्की की सरस्वती नदीच्या सुकाण्याची सुरुवात होण्याच्या पूर्वीचा काळ इ.स. पूर्व ५००० ते ३००० हा नक्की होता. त्याच्या नंतर हळूहळू प्रवाह आटत गेला आणि इ.स. पूर्व २२०० ते इ.स. पूर्व १९०० या दरम्यान पूर्ण आटला. याच कालखंडात सरस्वती-सिंधू संस्कृती विकसित झाली आणि या नदीबरोबरच नामशेषही झाली.
      ऋग्वेदामधील उल्लेख याच नदीच्या पूर्ण प्रवाही अवस्थेचे आढळतात. त्याचबरोबर आणखी एक अत्यंत सूक्ष्म खगोलशास्त्रीय निरीक्षण नोंदल्याचे आढळून येते. ऋग्वेदात वसंत संपात हा मृगनक्षत्रात येत असल्याचा उल्लेख आहे. ही प्रक्रिया सुमारे इ.स. पूर्व ५५०० ते इ.स. पूर्व ३००० पर्यंत होत होती. इ.स. पूर्व ३००० नंतर वसंत संपात कृत्तिका नक्षत्रात येत असल्याचा उल्लेख तैत्तिरीय संहितेत येतो. लोकमान्य टिळकांच्या 'ओरायन' या ग्रंथात याचे विस्तृत निवेदन आहे. या दोन्ही घटनांच्या उल्लेखानुसार ऋग्वेदाची रचना करायचा कालखंडही इ.स. पूर्व ५००० नंतर सुरू झालेला असणार कारण त्या वेळेस वसंत संपात मृग नक्षत्रात होत होता. पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मते सिंधू संस्कृतीचा हास हा इ.स. पूर्व २००० मध्ये झाला. मग त्या पुढील ५०० वर्षाचा काळ हा ऐतिहासिक दृष्ट्या या देशामध्ये अंधकारमय होता. लोक जंगलामध्ये किंवा छोट्या खेड्यांमध्ये राहत होते आणि या बिचाऱ्यांवर बाहेरून आलेल्या आर्यांनी तुफानी आक्रमण करून त्यांना पराजित केले. इ.स. पूर्व १५०० च्या दरम्यान याच आर्यांनी वेदांची निर्मिती केली. या युक्तिवादामध्ये आर्य बाहेरूनच वेद घेऊन आले असे निदान सांगितले जात नाही किंवा असे म्हणायला ते धजावले नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे वेदांमध्ये उल्लेखलेल्या नद्या, डोंगर आणि अन्य स्थळे ही सर्व भारतातीलच आहेत.
  वैदिक भारतीय आणि सिंधू-सरस्वती संस्कृतीतील भारतीय हे समकालीन का एकच ? यावर अद्याप वाद सुरू आहेत. परतु भारतीय कलांच्या इतिहासाचा विचार करता आपल्याला वेदाच आधार चारावा लागतो. याचे कारण असे की आजपर्यंतच्या कला परंपरांचे बीज हे थेट वेदशा में आढळते. त्यामुळे या परंपरेची अक्षुण्णता हाच धागा धरून आपल्याला भारतीय कलांचा मात्र घ्यावा लागतो. ऋग्वेदामध्येच अनेक कलांचे तपशीलवार वर्णन येते. ज्यामध्ये प्रामुख्याने नृत्य संगीत आहे. परंतु ऋग्वेदामध्ये कठीण परिस्थिती आलेल्या व्यक्तीने दहा गावे देऊन कोण मान इंद्राला विकत घेईल अशी पृच्छा केलेली आढळते. दुसऱ्या उल्लेखात इंद्राला दहा हजार किंवा श हजारालाही न विकण्याची चर्चा केली आहे. (नी. पु. जोशी, ऋग्वेद ४.२४.१० आणि ऋग्वेद ८.१.० याचा अर्थ देवदेवतांच्या मूर्ती ह्या नक्कीच कोरल्या जात होत्या. परंतु त्या दगडी नसून काष्ठ शिल असाव्यात. पुढील काळामध्ये म्हणजे इ.स. पूर्व ३०० (मौर्य काळात) दगडी शिल्पांचे उत्कृष्ट को काम सुरू झाले असावे. याचे फार थोडे पुरावे सापडलेले आहेत. पटना संग्रहालयामध्ये असतं दीदारगंज यक्षी या नावाने प्रसिद्ध असणारे शिल्प हे त्या काळातले मानले जाते. आजच्या पटल शहराजवळच दीदारगंज आहे. तेथे नदी काठावर अनेक वर्षे चिखलात गाडल्या गेलेल्या परंतु अत्या गुळगुळीत अशा एका दगडाचा वापर कपडे धुण्यासाठी तिथले धोबी करत होते. एक दिवशी दगडाखाली साप गेला असा संशय येऊन त्याला काढण्यासाठी हा दगड उचलला गेला. तेव्हा त्यांच लक्षात आले की अनेक दशके ते ज्याच्यावर कपडे धूत होते तो दगड नसून एका स्त्री मूर्तीची पाठ आहे हीच त्या दीदारगंजच्या यक्षीची शोध कथा. या मूर्तीविषयी एक गोष्ट मात्र नक्की सांगता येते की स्त्री देह शिल्पांकन कसे करावे हे त्या काळातच निश्चित झाले होते. हे शिल्प पाहताना स्त्री सौंदर्याचे मानुषीका (Womanhood personifide) झाले असेच म्हणावे लागेल. खरेतर ही यक्षीची मूर्ती नाही तर ती एक चौरीधारक स्त्रीची आहे. याचा अर्थ हिचे प्रतिबिंबरूप दुसरीही मूर्ती असली पाहिजे. त्याचबरोबर तिच्च हातातल्या चौरीने ती ज्या मूर्तीला वारा घालत असावी ती एखाद्या राजाची किंवा देवाची मूर्तीही त काळी असावी.
   भारतीय शिल्पकलेचा उगम जरी या कालखंडात झाला असला तरी त्याला गती मिळाली ती शु काळामध्ये, सम्राट अशोकाचा नातू बृहद्रथ याच्या मृत्यूनंतर (इ.स. पूर्व १८७) शुङ्ग वंशातीत असणाऱ्या आणि त्याच्याच सैन्याचा सेनापती असलेल्या पुष्यमित्राचा राज्याभिषेक झाला. सम्राट अशोकाच्या काळापासून असलेला बौद्ध धर्माचा राजाश्रय गेला. तसेच सम्राट अशोकाच्या अहिंसेचे अतिरेकी आणि अविवेकी आग्रहही पुष्यमित्राने सोडून दिले त्यामुळे तो अत्यंत लोकप्रिय झाला. असे असले तरीही बौद्ध पंथाचे अनुयायी हे समाजात होते. त्यामुळे राजाश्रयाशिवाय तो टिकवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू झाले. याच कालखंडात अफगाणिस्तानच्या प्रदेशातील काही ग्रीक लोकही बौद्ध झाले होते आणि त्यांना उपासनेसाठी मूर्तीची आवश्यकता जाणवत होती. ग्रीक संस्कृतीमध्ये मूर्तिपूजा प्रचलित होती. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीकांनी बांधलेती मंदिरे आणि त्यांचे अवशेष आजही त्यांच्या भव्यतेची साक्ष देतात. या मंदिरात ते त्यांच्या देवांच्या मूर्ती बसवत आणि त्याचे पूजन करत. तीच पद्धत त्यांनी त्यांच्या विस्तारलेल्या साम्राज्यातही आणली. पुढे हे ग्रीस देशापासून लांब राहणारे जेव्हा बौद्ध झाले तेव्हा त्यांना उपासनेसाठी आराध्य दैवताच्या मूर्तीची आवश्यकता भासू लागली. बौद्ध पंथात मूर्तिपूजा नव्हती तरी या ग्रीकांनी मूर्ती घडवून त्यांचे पूजन सुरू केले.
   याच काळात विशेषतः उत्तर भारतात भागवत धर्म मोठ्या प्रमाणात प्रभावी होता. विष्णू प्रमुख देव झाला होता. त्यामुळे त्या वैष्णवांनी विष्णूच्या मूर्ती घडवायला सुरुवात केली होती. त्याच प्रमाणे शैव पंथाचे अनुयायी लिंग रूपात शिवाचे पूजन करत होते. त्यामुळे बौद्धांनाही मूर्तिपूजनाची आवश्यकता अधिकच वाटू लागली. पांथिक स्पर्धेमुळे भारतीय मूर्तिकलेला खूपच मोठे प्रोत्साहन मिळाले.
   सनातन धर्मात, ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो, देवांची उपासना आणि पूजन हे व्यक्तिगत होते. त्याच्या विरुद्ध बौद्ध हा पंथ असल्यामुळे त्याची रचना श्रेणीशः होती. एकेश्वरवादी सर्व पंथांमध्ये अशीच रचना असते. त्यामुळे सामूहिक उपासना तिथे अपरिहार्य ठरते. आपल्या पंथातील अनुयायी टिकवून ठेवण्यासाठी हे करावेच लागते. अशा पंथांमध्ये सण फारच थोडे असतात. सतत सामूहिक पूजन करत असल्यामुळे एकत्रित येऊन काही 'साजरे' करायचे याचे प्रयोजनच राहत नाही. सामूहिक एकत्रीकरणासाठी काही विशेष वास्तूंची निर्मिती करावी लागते. अशा प्रकारच्या विशाल प्रार्थनास्थळांची निर्मिती मध्य आशियात, ग्रीस आणि रोम येथे झाली होती. बौद्धांच्या सामूहिक एकत्रीकरणासाठी अशा वास्तूंची निर्मिती झाली असावी असे स्तूप किंवा चैत्य लेणे यांचे स्थापत्य पाहून वाटते.
    सनातन धर्मात अशा सार्वजनिक पूजा करण्याच्या वास्तूंची आवश्यकताच नव्हती त्यामुळे त्या काळात जेव्हा मोठ्या प्रमाणात स्तूप आणि लेण्यांची निर्मिती होत होती तेव्हा देऊळ ही संकल्पना फारशी प्रचलित नव्हती. म्हणूनच त्या वेळेस देवळे बांधली गेली नाहीत. वैज्ञानिक प्रगतीच्या एका टप्प्यावर ते ज्ञान शाश्वत करण्यासाठी देवळे बांधण्याची गरज भासली आणि इसवी सनाच्या आठव्या शतकानंतर मोठी देवळे बांधली गेली.
     हिंदू धर्मात सणांचे वेगळे महत्त्व होते. त्या दिवशी समाजातील सर्वांनी भेदभाव विसरून एकत्रित येऊन आनंद साजरा करायचा. एकत्रित गायन आणि नर्तन त्यात होत असे. बदलत्या ऋतूप्रमाणे वर्षातील दिवस नक्की केले होते. त्या ऋतूप्रमाणे आरोग्याला हितकारक पक्वान्ने आणि मिष्टान्ने करून सर्वांनी एकत्रित भोजन करावे अशी रचना होती.
      हिंदू समाजाच्या आजच्या अवनत अवस्थेचे हेही एक कारण आहे. वैयक्तिक किंवा कुटुंबांपुरते मर्यादित असणाऱ्या देवांना चौरस्त्यावर नेले आणि त्यांचे सामूहिक पूजन सुरू केले; सामूहिकपणे साजरे करायचे सण मात्र फक्त कुटुंबांमध्ये साजरे होऊ लागले.

 ३  पूजास्थळांची निर्मिती को स्तूप आणि मंदिर 

चित्र क्र. ६ : महास्तूप, सांची

   सम्राट अशोकाने भगवान बुद्धाच्या स्मृती जागृत राहाव्यात म्हणून काही स्मारकांची योजना केली साधारणपणे १५ ते २० फूट व्यासांचे दीड ते दोन फूट उंचीचे असे अर्ध गोलाकार मातीचे उंचवटे त्यांनं केले. त्यांच्या भोवती एक तसेच छोटेखानी दगडाचे कुंपणही केले. या वास्तू प्रकाराला त्याने स्तूप असे नाव दिले. शुङ्ग काळामध्ये इ.स. पूर्व १५० ते २०० या स्तूपाचे थोडे आकारमान वाढले. सुमारे ३० फूट व्यासाचा अर्धगोलाकार उंचवटा आणि त्याच्याभोवती पुरुषभर उंचीचे बांधीव कुंपण असे याचे स्वरूप झाले. असा पहिला स्तूप हा भारहुत (म.प्र.) येथे आढळलेला आहे. त्याच्याभोवती असणारे कुंपण म्हणजे एक उभा दगडाचा खांब, त्यामध्ये समान अंतरावर तीन खोबणी, ज्यामध्ये आडवे तीन दगड बसवलेले होते. या कुंपणाला 'वेदिका' असे म्हणतात. या वेदिकेवर शिल्पांकन केलेले दिसते. ज्यामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रसंग आणि जातक कथा कोरलेल्या होत्या. सध्या या वेदिकेचे अवशेष भारूतला नसून दिल्ली, कलकत्ता आणि लंडनच्या संग्रहालयात आहेत. ही भारतामधील सर्वात जुनी शिल्पे किंवा शिल्पपट आहेत. यामध्ये शारीर रूपाने गौतम बुद्धांचे दर्शन होत नाही तर त्या ऐवजी पादुका ठेवलेले आसन किंवा बोधी वृक्ष आणि त्याभोवती हात जोडून उभे असलेले स्त्री पुरुष किंवा भक्त दिसतात. या शिल्पपटामध्ये नमस्कारासाठी जोडलेले हात हे डावीकडे किंवा उजवीकडे झुकलेले आणि एकच पंजा दिसेल असे कोरले आहेत. तसेच अनेक उभ्या शिल्पाची पावले एकाच दिशेला वळल्याचे ३० / प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे कोरले आहे. एवढी उणीव सोडल्यास अन्य सर्व तपशील मात्र विलक्षण सुबकतेने कोरले आहेत. देहयष्टी, केशभूषा, अलंकार इ. त्यांच्या बारकाव्यांसहित दिसतात. भगवान बुद्धांचे जीवन दाखवत असताना काही अन्य गोष्टीही त्यामध्ये समाविष्ट केलेल्या दिसतात. एक गोष्ट मात्र नक्की की सुरुवातीपासूनच शिल्पकलेचे उद्दिष्ट हे केवळ पूजनीय व्यक्तींचे स्मरण एवढेच न राहता यात सामान्य लोकांचे जीवन आणि त्याच्या आकांक्षाचाही समावेश करण्याचे होते. या स्तूपावरील नृत्यांगनांचे भाव आणि मुद्रा पाहताना जणू काही आजचेच शास्त्रीय नृत्य आपण पाहत असल्याचा भास होतो.
     या नंतरच्या काळात आढळलेला मोठा स्तूप म्हणजे सांचीचा (मध्य प्रदेश इ.पू. २ रे शतक). या काळापर्यंत स्तूपाचे आकारमान आता खूपच मोठे झालेले दिसते. त्याचा व्यास १५० फूट आणि उंची ५४ फूट आहे व त्याभोवती असलेली वेदिका असे ह्याचे स्वरूप आहे. ह्याच बरोबर चार दिशांना उभारलेली चार प्रचंड तोरणे. या स्तूपावरील सर्व शिल्प रचना ही केवळ या चार तोरणांवरच आहे. याच्या वेदिकांवर काहीही कोरीव काम नाही, दाने देणाऱ्यांची नावे मात्र कोरलेली आहेत. तोरणावरच्या कोरीव कामात गौतमबुद्धाच्या जीवनावरील प्रसंग, त्याने केलेले चमत्कार, अनेक जातक कथा तसेच नृत्य, मनोरंजन आणि सामान्यांचे जनजीवन हे कोरलेले आढळते. त्या काळातील जणू छायाचित्रणच केलेले आढळते. तोरणांवरील संपूर्णाकृती असलेल्या यर्शीचे शिल्पांकन हे भारतीय सौंदर्य कल्पनांचे कीर्तिमानच आहेत.
चित्र क्र. ७: सांची स्तूपावरील नायिका

हा कालखंड एकीकडे बौद्ध पंथाच्या राजाश्रयाशिवाय जगण्याचा आणि शुङ्गवंशामुळे वैदिक पंथाच्या उद्धाराचा होता. या काळामध्ये शंकराची लिंग रूपात पूजा आणि विष्णूची संकर्षण म्हणजेच बलराम, वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या रूपातील पूजा प्रचलित होती. या काळात विष्णूच्या सुबक मूर्ती घडल्या गेल्या असाव्यात परंतु त्याचे पुरावे किंवा तशी शिल्पे सापडलेली नाहीत. तसेच या काळातील देवळांची एकही वास्तू सापडलेली नाही.
  विदिशा (मध्य प्रदेश) जवळ बेसनगर या गावी एक स्तंभ आहे. ज्याच्यावर ब्राह्मी लिपीतील शिलालेख आहे. त्या वेळच्या अँटीअल्कीडास नावाच्या ग्रीक राजाचा हेलियोडोरस नावाचा राजदूत तिथे आला होता. त्याने हा शिलालेख कोरून घेतला. यामध्ये हा स्तंभ 'गरुड ध्वज' आहे. याचबरोबर त्या वेळेस तिथे शुङ्ग वंशाच्या भागभद्र राजाचे राज्य होते असाही त्यात उल्लेख आहे पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच शिलालेखात भक्त भागवत धर्माचे असल्याचे हिलियोडोरसने म्हटलेले आहे. असाच एक शिलालेख इ.स.पू. पहिल्या शतकात गुजरातमध्ये सापडला आहे, ज्यामय तोषा नावाच्या ग्रीक स्त्रीने भागवत धर्मात प्रवेश केल्याचा उल्लेख आहे. असल्याचा उल्लेख आहे.
       देवदेवस व (सुदे) वस गरुडध्वजे अयम् 
कारिते इ (अ) हेलीओदोरेण भाग 
वतेन दिवस पुत्रेण तख्खसिलाकेन 
योनदूतेन आगतेन महाराजस अंतलिकितस
 उप (म) ता संकासं-राओ कासीपुत्रस (भा) गभद्रस त्रातारस 
वसेन चतुदसेन राजेन वधमानस
चित्र क्र. ८ : शीलालेख, बेसनगर

अनुवादः देवांचा देव वासुदेवाचा (विष्णूचा) हा गरुडध्वज (स्तंभ) तक्षशिला निवासी असणाऱ्या दिया याचा पुत्र भक्त हेलिओडोरस याने उभारला आहे. ज्याला अँटीअल्कीडास या यवन राजाचा दूत म्हणून काशीपुत्र राजा भगभद्र जो वाराणसीच्या राजकन्येचा मुलगा आणि प्रजेचा त्राता होता त्याच्या राजवटीच्या चौदाव्य ह वर्षात पाठवले होते.
     या काळात स्तूपांबरोबर अनेक छोटी मंदिरेही बांधली गेली असावीत. यातील अनेक स्तूप किंवा त्यांचे अवशेष सापडलेले आहेत, मात्र एकही मंदिर किंवा त्याचे अवशेष सापडलेले नाहीत. त्यामुळे मंदिर बांधकामाच्या अगदी पहिल्या प्रकाराचे आकारमान आणि रचना यासंबंधी तर्कच करावं लागतात. तसेच हे बांधताना ते दगडी बांधकाम नसावे कारण तसे असते तर त्यातील काही वास्तू नक्कीच शेष राहिल्या असत्या. काही अभ्यासकांच्या मते ही मंदिरे झोपडीवजा किंवा लहान घरांच्या आकाराचं असावीत ज्यांच्या भिंती कुडाच्या / मातीच्या आणि छप्पर झावळ्यांचे किंवा कौलांचे असावे. भारतीए मंदिर परंपरेच्या उगमाचा एक महत्त्वपूर्ण पुरावा कालौघात नष्ट झाला. परंतु त्याची मूलभूत प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत गेल्यामुळे पुढील काळात तोच धागा धरून पुन्हा शाश्वत माध्यमातून ती बांधण्याचे प्रयत्न झालेले दिसतात.
    या स्तंभामुळे एक गोष्ट नक्की झाली की त्याच्यासमोर त्या काळी बासुदेवाचे मंदिर होते. आज त्यां स्तंभाभोवताली कुठलेही अवशेष दिसत नाहीत. या स्तंभाला 'गरुडध्वज' असे नाव दिले कारण त्याच्यावर पंख पसरलेल्या गरुडाचे शिल्प असावे. यावरून तेथील मंदिर हे वासुदेवाचे (विष्णूचे) असले पाहिजे. त्या काळात विष्णूची पूजा संकर्षण (बलराम), वासुदेव, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या रूपात होत होती. यांची स्वतंत्र मंदिरे आणि मूर्ती होत्या. त्या काळात जर बलरामाचे मंदिर असले तर त्यासमोर ताल ध्वज राहत असे आणि प्रद्युम्नाचे मंदिर असल्यास मकर ध्वज राहत असे. हा बलराम म्हणजे शेषाचा पुत्र, विष्णूच्या अवतारांपैकी एक.
चित्र क्र. ९: बेसनगर येथील गरुडस्तंभ

शुङ्गाच्या कालखंडानंतर कण्वांची राजसत्ता आली आणि इ.स.पूर्व दुसऱ्या पहिल्या शतकात ग्रीकांचा मिनँडर नावाचा एक सेनापती यानेही थेट बिहारपर्यंत मुसंडी मारून बराचसा प्रदेश जिंकला होता. परंतु त्यानेही नंतर बौद्ध धर्माचा स्वीकार करून मिलिंद हे नाव धारण केले. बौद्ध धर्माला पुन्हा राजाश्रय प्राप्त झाला. इ.स. च्या पहिल्या शतकामध्ये कुष्णाण सम्राटाचे आक्रमण झाले आणि त्याचीच सत्ता आली. हा जरी शूर लढवय्या असला तरी तो फारसा सुसंस्कृत किंवा साक्षरही नव्हता. इथली समृद्धी आणि संस्कृती पाहून तो भारावून गेला आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कनिष्काने मात्र एक चांगली गोष्ट केली आणि ती म्हणजे त्याने हिंदू धर्मालाही समान सन्मान दिला. इतकेच नव्हे तर संस्कृत अध्ययन आणि अध्यापनालाही पाठबळ दिले. गुरुकुलांना आश्रय दिला. अनेक संस्कृत पंडितांना काव्य, नाट्य, शास्त्र यावर ग्रंथसंपदा निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. कनिष्काच्या आणखीन दोन गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे, पहिली म्हणजे त्याने सोन्याची नाणी पाडली. हे करणारा तो पहिला भारतीय राजा, दुसरी गोष्ट म्हणजे त्याने तिबेट मार्गे जाऊन चीनवर आक्रमण केले. परराष्ट्रावर जाऊन आक्रमण करणारा तो एकमेव भारतीय राजा म्हणावा लागेल. त्या लढाईत त्याने चिनी सैन्याचा पराजय तर केलाच परंतु त्यांचे दोन राजपुत्र पकडून आणले. त्यांना सोडण्यासाठी प्रचंड मोठी खंडणीही वसूल केली.

 ४. सहेतुक शिल्पकलेच उषःकाल-कोरीव लेणी

चित्र क्र. १० : बाराबर गुहा, बिहार

इ.स. पूर्व तिसऱ्या शतकामध्ये काही आजीवक पंथातले मुनी हे सम्राट अशोकाला भेटले आणि त्यांनी एका कायमच्या आश्रयाची मागणी केली. आपल्या शेजारच्या देशामध्ये लेणी कोरण्याची कला ही अत्यंत विकसित अवस्थेला गेलेली होती. त्या वेळेस आपल्या शेजारचा देश म्हणजे आजचा इराण, इराणच्या पूर्वेपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि काश्मीर पासून कर्नाटकपर्यंत सम्राट अशोकाचे राज्य पसरलेले होते. इराण मधल्या नक्श-ई-बहाई या ठिकाणी इ. स. पूर्व १००० पासूनच लेणी कोरली जात होती. अशोकाला काही आजीवक पंथाच्या भिक्षूनी विनंती केल्यामुळे त्यांना एकांतात साधन करता यावी म्हणून त्याने बाराबर येथे काही लेणी कोरून घेतल्या. तिच भारतातील पहिली लेणी! बाराबार हे स्थान आजच्या पटना शहरापासून दक्षिणेकडे ७५ कि.मी. अंतरावर आहे. तिथे डोंगराक ग्रॅनाईटच्या विशाल शिलांमध्ये ही लेणी कोरण्यात आली. तिथे एकूण लहान मोठ्या अशा ३२ लेण्य आहेत. त्यातील लोमश ऋषी गुंफा ही भारतातील पहिली लेणी आहेत. मानवी हातांनी कोरलेल्या गुंफेला लेणे किंवा लेणी असे म्हणतात. या लेण्यांमध्ये गजपृष्ठाकाराचे छत असून सर्व लेण्यांमधं आतील बाजूने भिंतींना आणि छतावर विलक्षण झिलई करण्यात आलेली दिसते. त्या भिंतीवर कुठे हात लावल्यास संपूर्ण पृष्ठभाग अत्यंत गुळगुळीत असल्याचे जाणवते. याला 'मौर्यन् पॉलिश' असे म्हणतात. मौर्य काळानंतर पुढील काळात दगडांना असे गुळगुळीत करण्याची कला कुठे दिसत नाही. या लेण्यांमध्ये अनेक शिलालेखही कोरलेले आहेत.
चित्र क्र. ११ : लोमश ऋषी गुहा, बिहार

     भगवान बुद्धांच्या आदेशा- नुसार अनेक भिक्षु देशभर धर्म प्रचारासाठी बाहेर पडले. त्यांना धर्माच्या नियमांचे अत्यंत काटेकोर पालन करावे लागत असे. त्यामध्ये नियम होता की एका घरात दोन पेक्षा अधिक वेळेला भिक्षा न घेणे आणि एकाच गावात दोन पेक्षा अधिक दिवस मुक्काम न करणे. हे भिक्षु महाराष्ट्रात आले तेव्हा पावसाळ्यात त्यांच्याकडून या नियमाचा भंग होऊ लागला. अचानक दुथडी वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांमुळे हे भिक्षु दिवसेंदिवस एकाच गावात अडकून पडत. भगवान बुद्धाने त्यांना एक मार्ग सुचवला. या सर्व भिक्षूनी पावसाळ्याचे चार महिने एकत्रित राहावे आणि पाऊस संपल्यावर पुन्हा प्रचाराला बाहेर पडावे. या एकत्रित राहण्याला 'वर्षावास' असे म्हणत.
     महाराष्ट्रामध्ये म्हणजे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या प्रचंड रांगांनी व्यापलेला आहे. हा यातील खडक हा 'कृष्णपाषाण' ज्याला इंग्रजीत 'ब्लॅक बेसॉल्ट' असे म्हणतात. त्याचे वैशिष्ट्य असे की या दगडापासून तयार झालेला संपूर्ण डोंगर हा एकच आणि एकसंध खडक असतो. त्यामुळे त्यातील अंतर्गत कणांची संरचना ही पण समान असते. तसेच अनेक ठिकाणी बारीकशा भेगांमधून पाझरलेले पावसाचे पाणी हे त्या खडकात असणाऱ्या पोकळ्यांमध्ये साठवले जाते.
    बारबारची लेणी झाल्यावर भिक्षूना असे वाटले की महाराष्ट्रामध्ये वर्षावासासाठी जर अशा लेण्या कोरल्या तर निवासाची समस्या कायमची सुटेल. त्याचा पहिला प्रयोग हा लोणावळ्याच्या अलीकडे, आजच्या मळवली स्थानकाच्या मागे, भाजे गावालगत असणाऱ्या डोंगरात झाला. महाराष्ट्रात कोरली गेलेली ही पहिली लेणी. या उपक्रमासाठी अनेकांनी दाने दिली होती. त्या काळी महाराष्ट्रामध्ये बौद्धपंथाचा प्रभाव मोठा होता. त्यामुळे या कामासाठी अनेकांकडून दानाचा ओघ सतत सुरू राहिला. लेणी कोरणे ही त्या काळची एक धार्मिक स्पर्धात्मक चढाओढच सुरू झाली. हे लेणी कोरण्याचे लोण पुढील १०००-१२०० वर्ष सुरू होते. देशातल्या अनेक भागात लेणी कोरली गेली. आज भारतात अशा कोरलेल्या लेण्यांची संख्या सुमारे १२०० एवढी असली तरी त्यातली १००० हून अधिक लेणी पश्चिम महाराष्ट्रातच आहेत.
   लेणी कोरल्यामुळे भिक्षूची चार महिने निवासाची व्यवस्था झाली. परंतु उरलेले आठ महिनेही या वास्तूंचा उपयोग होऊ लागला. वैश्य किंवा व्यापारी समाजातील बहुसंख्य लोक बौद्ध पंथीय होते. त्यांच्या मालाची वाहतूक ही उंट, घोडे, बैल यांच्या तांड्यांच्या मार्फत होत असे. हे व्यापारी तांडे या लेण्यांमध्ये निवासाला थांबत. तेथील भिक्षु त्यांच व्यवस्था पाहत असत. यामुळे असे दिसते की ही बहुतांश लेणी त्या वेळच्या प्रचलित व्यापारी मार्गाव आहेत. त्यातले अनेक व्यापारी मार्ग हे आजही वापरात आहेत. ह्याच पद्धतीच्या लेणी ओरिसामध्ये खारवेल या जैन पंथीय राजाने कोरल्या होत्या. भुवनेश्वर जवळील दोन डोंगरांमध्ये उदयगिरी आणि खंडगिरी या नावाने हे लेणी समूह आहेत. महाराष्ट्रातील अनेक लेण्यांमध्ये काही शिल्पांबरोबरच अनेक चित्रेही त्यात काढलेली आढळतात. अजिंठ्याच्या लेणींच्या प्रवेशद्वारांवर माती ढासळल्यामुळे त्या लेणी झाकल्या गेल्यामुळे सुस्थितीत राहिल्या. अन्य लेण्यांमधल्या चित्रित भिंतींवरचे रंग उडून गेले इसवीसनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत या लेण्यातील कोरीव कामात गौतम बुद्धाची शारीर रूपातील प्रतिम दिसत नाही.
चित्र क्र. १२: भाजे लेणी, महाराष्ट्र

 ५. हिंदू शिल्पांची निर्मिती


चित्र क्र. १३ : शेषशायी विष्णू, देवगड

पुरातत्त्वामध्ये बौद्ध गुंफा, जैन गुंफा हे त्या त्या पंथाच्या अनुयायांनी कोरल्यामुळे त्या शैलींचे नामाभिधान आहे. वैदिक परंपरेतून हिंदू लेण्यांची निर्मिती झाली. तसेच मूर्तिशास्त्रातही जैन, बौद्ध आणि हिंदू कला हे त्या शैलींचे नामकरण केले आहे. कनिष्काने दिलेल्या प्रोत्साहनामुळे बौद्ध आणि संस्कृत साहित्याची निर्मिती होऊ लागली. बौद्ध पंथ हा राजाश्रयामुळे सुदृढ होता. वैदिक पंथामध्ये मात्र सम्राट अशोकानंतर आमूलाग्र परिवर्तन सुरू झाले. हिंदू समाजातील वर्णाश्रमामुळे अनेक हिंदू हे जैन किंवा बौद्ध धर्माकडे आकृष्ट होत होते. यज्ञ संस्था सुरू होती. मात्र त्यातील बळीची प्रथा बंद झाली आणि पूजापद्धतीमध्ये भक्तिमार्गाचा उदय झाला. अनेक जाती जमातींच्या दैवतांचा, शिव, विष्णू आदी प्रमुख दैवतांबरोबरच हिंदूंच्या इतर देवांचा देवतागणात समावेश झाला. याचबरोबर देवाच्या दारी सर्व एक या सूत्राने समाजाला एकरूप ठेवण्याचा प्रयत्न सुरू झाला. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून 
भक्तिमागनि खूपच जोर धरला. विष्णूची चार रूपे न राहता त्याचे अनेक अवतार झाले. तर शिवाचे लिंग रूपातील पूजन होत असून सुद्धा त्याचे, पार्वती, गणपती, कार्तिकेयासह परिवाराचेही पूजन होऊ लागले. या सर्व देवासंबंधीच्या कथा त्या वेळच्या पुराणांमध्ये प्रथम आल्या. चौथ्या शतकानंना देशामध्ये सत्ता पालटाचे वारे वाहू लागले आणि गुप्त घराण्याचा उदय होऊन मौर्यांसारखेच अत्यंत प्रबळ सत्ता केंद्र स्थापन झाले. पुराण कथांच्या रोचकतेमुळे त्या अत्यंत लोकप्रियही झाल्या (आजो आहेत). ह्याच बरोबर पुराणिकांनी एक मोठे कार्य असेही केले की त्यांच्या प्रवचनात त्यांनी रामायण आणि महाभारताप्रमाणेच पुराण कथाही सांगायला सुरुवात केली. हे काम संपूर्ण देशभर केले गेले असे दिसते. यामुळे देशाची वैचारिक एकात्मता दृढपणे प्रस्थापित झाली. याच काळामध्ये देशात राष्ट्रीय ऐक्याची भावनाही सुनिश्चित झाली (इसवी सनाच्या चौथ्या शतकात) आणि राष्ट्रवादाचा उदय झाला. चाणक्याच्या काळीही अशीच राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करून त्याने बाल्हीक प्रांतावरील ग्रीकांचे आक्रमण मोडून काढले होते.

मूर्तिशास्त्राचा उगम :-

    पुराण कथांना दृश्य रूप दिल्यास त्यांचे ग्रंथांशिवाय जतन आणि संवर्धन होऊ शकेल असे त्या काळातील काही धुरीणांना वाटले. देवांच्या कथा तर होत्याच आणि त्याप्रमाणे त्या कथांचे रंगभूमीव नृत्य नाट्यातून सादरीकरणही सुरू होते. त्यामुळे त्यांना मूर्ती रूपामध्ये परिवर्तित करावे असे वाटणे स्वाभाविक होते. लेणी कोरणाऱ्यांच्या परंपरेमुळे उत्तम छिन्न्या, हातोड्या करण्याचे शास्त्र विकसित झाले होते. तसेच उत्तम शिल्पेही तयार झाली होती. आधीच्या काळातील विष्णूच्या व्यूहांच्या प्रतिमांऐवजी आता विष्णूचे अवतार साकारता येणार होते. त्याच बरोबर ब्रह्मा, नवग्रह, गंधर्व इ. देव तसेच लक्ष्मी, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, सप्तमातृका या स्त्री देवतांबरोबरच अन्य व्यंतर देवताही आकार घेऊ लागल्या. या सर्वांमध्ये समानता यावी यासाठी दोन गोष्टी करणे आवश्यक होते. एक म्हणजे त्यांचे स्वरूप नक्की करणे आणि दुसरे म्हणजे त्यांचे प्रमाणीकरण करणे. हे प्रमाणिकीकरण करण्यासाठी मात्र एक अत्यंत कल्पक आणि व्यवच्छेदक निकष लावला गेला. त्याचे नाव 'लांछन', देवदेवतांची वाहने आणि त्यांच्या हातातील शस्त्रे याला 'लांछन' असे म्हणतात. याच्या निश्चितीमुळे शंकर म्हणजे त्रिशूल, डमरू, भुजंग, चंद्र आणि गंगाधारी. त्याचे वाहन नंदी. विष्णू म्हणजे शंख, चक्र, गदा आधि पद्मधारी ज्याचे वाहन गरुड. याचप्रमाणे सर्व देवतांची लांछने ठरवली गेली. या काळानंतर केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर कुठेही हिंदू देवतांच्या मूर्ती करताना या नियमात तसूभरही फरक केलेता दिसत नाही. मूर्तीचे प्रमाण, सुबकता, प्रतिभा, नवनवीन प्रयोग, विविध भौगोलिक परिस्थितीमुळे केशभूषा, वेशभूषा, राहणीमान आणि आहारामध्ये प्रांताप्रांतात विविधता येऊ शकते, इतकेच नाहीत  त्याला अनेक भाषांची जोड आहे. एकच भाषा दर सहा मैलावर वेगळी बोलली जाते. तसेच भौगोलिक प्रदेशाप्रमाणे वेशभूषा आणि आहार पद्धती सुद्धा भिन्न असणे स्वाभाविक होते. परंतु त्यामुळे परकीय अभ्यासकांच्या मते भारतात अनेक संस्कृतींचे मिश्रण होते असा गैरसमज झाला आणि या भ्रामक कल्पनेचा प्रचार आणि प्रसार आजचे विद्वानही करताना दिसतात. परंतु वरील बाह्य निकषात एकात्मता असूच शकत नाही. या देशाच्या एकतेचे व सांस्कृतिक एकात्मतेचे सर्वात प्रबळ पुरावे म्हणजे हिंदू देवता, मूर्ती आणि प्राचीन मंदिरे. ज्यातून हे निर्विवादपणे सिद्ध होते की इथे एकच संस्कृती नांदत होती, आजही नांदते.

६. मंदिर कल्पनेचा विस्तार आणि विकास

चित्र क्र. १४: भूवराह, उदयगिरी

लेणी मंदिरे

   इ.स.पूर्व दुसऱ्या शतकामध्ये काही मंदिरे बांधली गेली, परंतु त्यातील एकही वास्तू सापडलेले नाही. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये देवायतन असा उल्लेख येतो. कुठल्या चौकात कुठले मंदिर असाई असेही त्रोटक उल्लेख आहेत. परंतु ह्या सगळ्या लहान वास्तू असाव्यात असे वाटते. मूर्तिशास्त्राचे निका प्रमाणित झाल्यावर या मूर्तीना कुठेतरी बसवले गेले पाहिजे हे तर नक्कीच होते. त्यासाठी प्रचलित लेणी कोरण्याच्या पद्धतीमध्ये लेणी मंदिरे करण्याचा प्रयोग झाला. गुप्त वंशाचा चंद्रगुप्त द्वितीय (इ.स. ३८० ते  ४२०) याच्या कारकिर्दीत मध्य प्रदेशमध्ये विदिशाजवळ लेणी मंदिर कोरण्याचा प्रयोग झाला आजच्या भिलसा या गावी 'उदयगिरी गुंफा' या नावाने ते प्रसिद्ध आहे. यामध्ये एकाच डोंगरात दोन- तीन मंदिरे करण्याचा तो प्रयोग होता. त्यातल्या एका गुहे बाहेर स्तंभावर आधारित छत असेहे करण्याचा प्रयोग केला. आज तो भाग अस्तित्वात नाही. यामध्ये एक केवळ शेषशायी विष्णूचेही शिल्प एका गुहेत कोरले आहे. त्याच्या शेजारी वराहाचे मोठे शिल्प असलेली गुंफा हे तेथील सर्वात मोठे लेणीमंदिर. यातील मूर्तीचे तपशील पुढे येतीलच. देशातील अन्य काही लेणी मंदिरांमध्ये कर्नाटकातील बदामी, ऐहाळे (इ.स.६. वे-७ वे शतक), आंध्र प्रदेशमधील अक्कण्णा मादण्णा, मोगलाजपुरम्, उंडवली (इ.स.७ वे ८ वे शतक), महाराष्ट्रातील वेरुळ (क्रमांक १४ ते ३१), घारापुरी-मुंबई, पाताळेश्वर-पुणे (इ.स. ७ वे ते ९ वे शतक) यांचा उल्लेख करता येईल.

चित्र क्र. १५: उदयगिरी लेणी, विदिशा

चित्र क्र. १६: दशावतार मंदिर, देवगड

बांधलेली मंदिरे (इ.स. ४ थे ते ८ वे शतक)

   या लेणी मंदिरे कोरण्याच्या कालखंडात दगडावर दगड रचून मंदिरे करण्याचाही प्रयोग सुरू झाला. देवगड, नचना, भुमराह या गावी ही सुरुवातीच्या काळात बांधलेली मंदिरे आढळतात. एका चौथऱ्यावर ज्याचे माप साधारण २०-२० फूट आणि ज्याच्यावर साधारण १०-१० फूट उंचीचे चौकोनी बांधकाम. ज्यामध्ये एक गर्भागृह आहे असे यांचे स्थापत्य आहे. संपूर्ण देशभर अशा पद्धतीची दगडी मंदिरे बांधण्याचे किंवा लेणी मंदिरे कोरण्याचे काम या काळानंतर सुरू झालेले दिसते. बांधलेल्या मंदिरामध्ये सातव्या शतकापर्यंत लहान आकाराचीच मंदिरे प्रामुख्याने बांधली गेली. यांची सर्वात मोठी प्रयोग शाळा कर्नाटकमधील पट्टदकल आणि ऐहोळे या गावी आढळते. येथे विविध प्रकारच्या आणि आकारांच्या मंदिरांचे प्रयोग केलेले दिसतात. नागर, द्राविड इ. शैलींची मंदिरे इथे दिसतात. नागर म्हणजे वर निमुळते होत जाणारे शिखर. तर द्राविड म्हणजे आडव्या थरांमध्ये विभागून निमुळते होणारे शिखर. अशी या शैलींची नावे आणि प्रकार आहेत. या समूहातील सर्वात मोठे मंदिर (विरुपाक्ष मंदिर) हे साधारणतः ३० फूट उंचीचे आहे.

चित्र क्र. १७: पार्वती मंदिर, नचना

मोठी मंदिरे (इ.स. ८ वे ते १३ वे शतक)

    या संपूर्ण कालखंडामध्ये म्हणजे वेदकाळापासून सातव्या शतकापर्यंत या वैचारिक आणि धार्मिक प्रगती बरोबरच वैज्ञानिक प्रगतीही समांतर आणि तितक्याच गतिमानतेने धावत होती. किंबहुना अनेक वेदांमधल्या कथांपासून पुराणकथांमध्ये वैज्ञानिक सिद्धान्ताचे संदर्भ दिसतात. वेदकाळापासून भारक वैज्ञानिकांची एक अक्षय्य परंपराही सातत्याने दिसते. याच परंपरेमध्ये सातव्या शतकामध्ये २० प्रदेशामध्ये कायथा या गावी वराहमिहीर नावाच्या एका थोर शास्त्रज्ञाचा जन्म झाला. त्याच्य 'बृहद्ङ्कथा' या ग्रंथामध्ये स्थापत्यशास्त्रावर एक स्वतंत्र अध्यायच आहे. त्यात त्याने स्थपतिर ब्रह्मांडाची प्रतिकृती ज्यात दिसेल अशी वास्तू साकारण्याचे आवाहन केले आहे. यानंतरच्या काळात मंदिर स्थापत्यांमध्ये केवळ देवदेवतांच्या मूर्तीना ठेवण्याचे स्थान असा हेतू न राहता, त्याचबरोबर प्रचंड आकारमानाच्या वास्तूंचीही निर्मिती करण्याचे चिंतन आणि प्रयोग सुरू झाले. विशाल मंदिर निर्मितीच्या परंपरेला या देशातील शास्त्रज्ञ कारणीभूत ठरले आहेत.

चित्र क्र. १८: रथमंदिर, महाबलीपुरम

    महाबलीपुरम् येथे अखंड दगडातून कोरून मंदिर करण्याचेही प्रयोग सातव्या शतकात सुरू झाले होते. यामध्ये पाच पांडवांचे रथ हा त्यापैकीच एक प्रयोग. इथे समुद्रकिनाऱ्यावर असलेले दगडात बांधलेले एक मोठे मंदिर आहे. ज्याला 'शोर टेम्पल' असे म्हणतात. महाबलीपुरम्ची मंदिरे नरसिंहवर्मन पहिला (इ.स. ६३० ते ६७०) या राजाच्या काळात बांधली गेली. आठव्या शतकात सुरुवातीला कांचीपुरम येथे कैलासनाथान मंदिराचे बांधकाम झाले. राजा नरसिंहवर्मन दुसरा (इ.स. ६९० ते ७१५) व त्याची राणी रंगपताका यांच्या प्रयत्नांनी हे कैलास मंदिर उभारण्यात आले. मोठ्या आणि भव्य मंदिराची सुरुवात इथून आली. याच्यानंतर राजा नंदिवर्मन (इ.स. ७१७ ते ७७९) याच्या कालखंडात कांचीपुरमचे प्रसिध्द वैकुंठ-पेरूमाळ मंदिराचे बांधकाम झाले. आजही हे भव्य मंदिर तेथे आहे. परंतु जीर्णोद्धारामध्ये त्या मूळ स्वरूप गेले आहे. मंदिरे बांधायचे कार्य सुरू झाले आणि या कालखंडानंतर हजारो मंदिरांचे
निर्मिती देशभरात झाली असली तरी त्यातली विकसित आणि भव्य मंदिरांची संख्या मात्र खूपच कमी आहे.
    या पुढील काळात विकसित अवस्थेतील मंदिराचे स्थापत्य प्रस्थापित होऊ लागले होते. मुखमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी साधारणतः या मंदिरांची रचना होती आणि गर्भगृहावरती उत्तुंग असे शिखर ज्याची उंची ५० फुटापेक्षाही अधिक होती. ही झाली मोठी मंदिरे बांधण्याची सुरुवात. यानंतर देशातील अन्य भागातही अशी मंदिरे बांधण्याचे प्रयोग सुरू झाले.

चित्र क्र. १९: कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम

    राष्ट्रकूट वंशाचा राजा कृष्ण पहिला (इ.स. ७५६ ते ७७३) याच्या काळात महाराष्ट्रामध्ये वेरुळ मधल्या कैलास मंदिराचे काम सुरू झाले. असे म्हणतात की त्याची राणी माणिकावती हिने कांचीपुरम येथील कैलासनाथाच्या मंदिरासारख्या पण त्याहूनही भव्य अशा महाराष्ट्रात बांधल्या गेलेल्या मंदिराचा कळस पाहिल्याशिवाय आपण अन्न ग्रहण करणार नाही अशी विचित्र प्रतिज्ञा केली. एका व्यक्तीच्या उपोषण काळात पन्नास फुटाहून अधिक उंचीचे आणि भव्य मंदिर बांधून काढणे अशक्यच होते. या समस्येवर मात करण्यासाठी पैठणचा एक अज्ञात शिल्पी पुढे सरसावला. त्याने डोंगरावर जाऊन दोन दिवसांमध्ये एका देवळाचा केवळ कळस कोरला व तो त्या राणीला दाखवून तिची प्रतिज्ञा पूर्ण केली असे म्हणतात. इथून एका डोंगरातून संपूर्ण आणि एकसंध मंदिर कोरण्याच्या अचाट प्रयोगाची सुरुवात झाली. हे मंदिर कोरण्याचे काम जे इसवी सनाच्या आठव्या शतकात (सुमारे इ.स. ७७० पासून) सुरू झाले ते दहाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत (इ.स. ९१३) म्हणजे कृष्ण राजाच्या पतवंडांपर्यंत सुरू होते. शंभर फूट उंच, १७० फूट रुंद आणि जवळ जवळ १७५ फूट लांब असे विराट मंदिर साकार झाले. कांचीपुरमच्या मंदिराशी स्पर्धा असल्यामुळे पूर्णपणे दक्षिण भारतीय धाटणी (द्राविड शैलीचे) असूनही परंतु महाराष्ट्रात प्रकटलेले, तसेच महाराष्ट्रातले हे सर्वात मोठे मंदिर आहे.

चित्र क्र. २०: कैलास मंदिर, वेरूळ

  दहाव्या शतकामध्ये उत्तर भारतात खजुराहो येथे चंदेल घराण्याच्या महासत्तेचा उदय झाला.या कालखंडात येथे मंदिर बांधण्याच्या कामाला विलक्षण गती आलेली दिसते. याच वंशातील यशोवर्मन (लक्ष्मण वर्मा) (इ. स. ९२५ ते ९५०) याने खजुराहो येथील लक्ष्मण मंदिर हे पहिले भव्य मंदीर बांधले. याचा मुलगा धंगदेव (इ.स. ९५० ते १००२) याने विश्वनाथ आणि पार्श्वनाथ ही दोन देखणी बांधली. त्यानंतर राज्यावर आलेल्या गंडदेवाच्या कारकिर्दीत जगदंबी आणि चित्रगुप्त ही मंदिरे बांधली गेली. ह्यानंतर याचा मुलगा विद्याधर (इ.स. १००४ ते १०२९) हा गादीवर बसला. त्याने इ.स. १०१९ ते १०२२ या काळामध्ये महंमद गजनीचा दोनदा युद्धात पराजय केला. यानेच खजुराहो मधल्या खंडारिया महादेव या मंदिराची निर्मिती केली. इ.स. ११०० पर्यंत खजुराहोमध्ये एकूण ८५ मंदिरे बांधली गेली. त्यातील आज १० ते १२ शिल्लक आहेत. एकाच परिसरात भव्य मंदिरांची निर्मिती असणारे हे भारतातील एकमेव स्थान आहे.

चित्र क्र. २१ : लक्ष्मण मंदिर, खजुराहो

 १०० फूट उंचीची लक्ष्मण, विश्वनाथ आणि खंडारिया महादेव अशी तीन मंदिरे खजुराहो येथील पश्चिम समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मैदानात आहेत. या नंतरच्या काळातील भव्य मंदिराची निर्मिती तामिळनाडू प्रांतातील तंजावर येथे झाली. चोल घराण्याचा राजराजा चोल (इ.स. ९८५ ते १०१२) आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोल (इ.स. १०१२३ १०४४) याच्या कारकिर्दीत भारतातील अतिभव्य अशा दोन मंदिरांची निर्मिती झाली. यातील तंजावर येथील बृहदीश्वराच्या मंदिराचे बांधकाम राजराजाच्या कारकिर्दीत सुरू झाले परंतु ते संपूर्ण होण्याला आतच त्याचा मृत्यू झाला, त्याचा मुलगा राजेंद्र चोल याने ते बांधकाम पूर्ण करून घेतले. परंतु त्याचबरोबर तिथून जवळच गंगाईकोंडचोलापुरम येथे दुसरे बृहदीश्वर गंगाईकोंडचोलेश्वराचे मंदिर बांधले. दोन्ही मंदिराचे वैशिष्ट्य असे की तत्कालीन मध्यम आकारांच्या मंदिरापेक्षा जवळजवळ ४० पटीने हैं मंदिरे मोठी आहेत. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराला 'दक्षिण मेरू' असे संबोधले आहे आणि भगवान शिव म्हणजे अवकाश या कल्पनेचे हे परमाकाश असे रूप आहे. (वात्स्यायन १९९६, नागास्वामीः ३०१ - ३०८). ह्या दोन्ही मंदिरांची उंची अनुक्रमे २०० फूट आणि १८० फूट एवढी आहे.

चित्र क्र. २२: बृहदीश्वर मंदिर, तंजावर

तेराव्या शतकामध्ये ओरिसामध्ये राजा नरसिंह देव दुसरा (इ.स. १२३४ ते १२६८) याने इ.स. १२५८ मध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर बांधले. या मंदिराच्या गर्भगृहावरील शिखराची उंची २२० फूट एवढी होती. भारतातील हे सर्वात मोठे मंदिर होते. सतराव्या शतकात हा भाग ढासळला आणि आज त्याचे १८० फूट उंचीचे जगमोहनावरील शिखर उभे आहे. इ.स. १२४४ मध्ये राजा नरसिंह देव याने बंगालवर स्वारी केली आणि तेथील सुलतान तुघ्रील तुघान याचा दारुण पराभव करून तो प्रदेश मुक्त केला. त्याच्यात त्याला प्रचंड मोठी संपत्ती मिळाली. ही मिळालेली संपत्ती त्याने सर्व सैनिकांमध्ये वाटून टाकण्याची योजना केली. हे त्याच्या आईला कळताच तिने त्याला विचारले की या संपत्तीवर फक्त सैनिकांचाच अधिकार कसा? तुम्ही रणांगणावर लढत असताना येथील सर्व समाजही तुमच्या लढ्यात सामील असतोच. तेव्हा या संपत्तीवर सर्व समाजाचा अधिकार आहे, म्हणूनच या धनाचा विनियोग समाजहितासाठीच झाला पाहिजे. हे ऐकल्यावर राजाने आपला निर्णय बदलला आणि या भव्य मंदिराच्या निर्मितीसाठी तो पैसा वापरला. या मंदिर निर्मितीचा सर्व तपशील बय चकडा या १३ व्या शतकात सापडलेल्या हस्तलिखितात आढळतो.
   मंदिराचे स्थापत्य अभ्यासताना असे लक्षात येते की भारतामध्ये १०० फूट किंवा अधिक उंचीची फारच थोडी मंदिरे शिल्लक आहेत. खजुराहो येथील वैद्यनाथ मंदिर आणि त्यासारखी तिथली अन्य मोठी मंदिरे ही १५ व्या शतकात आलेल्या सिकंदर लोधी याने तर विदिशा येथील बीजमंडल हे भव्य सूर्य मंदिर १७ व्या शतकात औरंगजेब याने उद्ध्वस्त केले. तसेच चंदेल घराण्याने बांधलेली सिंहोनिया येथील भव्य मंदिरेही अत्यंत भग्न अवस्थेत उभी आहेत.

चित्र क्र. २३ : सूर्यमंदिर, कोणार्क

७. प्रमुख देव - ब्रह्म


चित्र क्र. २४: ब्रह्मदेव, देवगड

मंदिराच्या निर्मितीचे प्रयोजन हे अत्यंत विकसित अवस्थेत पोहोचलेल्या शिल्पकलेन जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे माध्यम म्हणून होते. या शिल्पांमध्ये प्रामुख्याने देवदेवतांची शिल्प असतात, ज्यामध्ये मुख्य देवता, उपदेवता आणि इतर देवतांचा समावेश केलेला असतो. परंतु मंदिरावरील सर्व शिल्पे ही फक्त देवांचीच नसतात. त्यात काही अन्य शिल्पांचाही समावेश केलेल दिसतो. यामध्ये यक्ष, गंधर्व, दिक्पाल, नवग्रह इ., सुरसुंदरी, नायिका, व्याल आणि कामशिल्पे बांच अंतर्भाव असतो.
ब्रह्मदेव :-
   पूजेमध्ये असलेले ब्रह्मदेवाचे स्वतंत्र राजस्थानामधील पुष्करतीर्थ येथे एक देऊळ आहे. मुळ देवळाचा जीर्णोद्धार झाल्यामुळे आज तेथे थोड्या नवीन धाटणीचेच मंदिर दिसते. मूळ मंदीर इ.स. १८०२ मध्ये बांधले होते. (बॅनर्जी : १९४१) हा अपवाद सोडल्यास प्राचीन मंदिरांमध्ये ब्रह्मदेव मंदिरे दुधही आणि खजुराहो (म.प्र.), खेड ब्रह्मा (इडर, गुजराथ), वसंतगड (राजस्थान), उन्का (हुबळीजवळ, कर्नाटक) आणि गौड (माल्डा, बंगाल)  येथे आहेत. यातील खजुराहोचे मंदिर, ब्रह्माचे नसून शिवाचे आहे. गर्भागृहामध्ये असलेल्या चतुर्मुखी लिंगामुळे त्या मंदिराला ब्रह्मा मंदिर हे नाव दिले गेले. सर्व मंदिरांमध्ये ब्रह्मदेवाचे शिल्प मात्र आढळते. साधारणतः सर्व ठिकाणी तीन तोंडाची ही पुरुषाची मूर्ती बसलेली किंवा उभी असते. चौथे तोंड हे मागच्या बाजूला असल्याने दर्शकाने ते असल्याचे गृहीत धरायचे असते. मधल्या मुखाला लांब दाढी असते आणि ही मूर्ती कमळावर बसलेली असते. डाव्या खांद्यावर यज्ञोपवीत व काही शिल्पांमध्ये मृगाजिन असते. या मूर्तीला चार हात असतात आणि उजव्या खालच्या हातामध्ये अक्षमाला, उजव्या वरच्या हातामध्ये स्रुवा, डाव्या खालच्या हातामध्ये कमंडलू असते आणि डाव्या वरच्या हातामध्ये पुस्तक (पोथी). काही मूर्तीमध्ये खालचा उजवा हात अभय किंवा वरद मुद्रेतही असतो. त्याचे वाहन हंस असते आणि त्याच्याबरोबर एक स्त्री (सावित्री) किंवा दोन स्त्रिया (सावित्री आणि गायत्री किंवा सावित्री आणि सरस्वती) असतात.

चित्र क्र. २५ :ब्रह्मदेव सावित्री, पाटण

ब्रह्मदेव हा ब्राह्मण, वेदांचा स्रोत आणि यज्ञाचा पुरस्कार करणारा आहे. त्याने आपल्या चार तोंडांनी चार वेदांना प्रकट केले. संहाराशी त्याचा संबंध नसल्यामुळे त्याच्या हातात शस्त्र दिसत नाही. त्याचे पोट किंचित सुटलेले व शरीर थोडे स्थूल दाखवतात. (जोशीः १९७९) चार मुखे ही चार वेदांचे प्रतीक मानली जातात. काही प्रतिमांमध्ये त्याच्या पायाशी चार मानव प्रतिमा दाखवल्या जातात, जे चार वेदांचे प्रतिनिधित्व करतात. ब्रह्मदेवाचे शिल्पांकन काही संयुक्त प्रतिमांमध्येही दिसते. यामध्ये हरी-हर-सुर्य-पितामह किंवा ब्रम्हेशानजनार्दनार्क, (ब्रम्हदेव, ईशान (शिव), जनार्दन ( विष्णु ) अर्क ( सुर्य ) या प्रकारच्या मूर्तीमध्ये चार मुखांची आणि आठ हातांची देव प्रतिमा असते ज्यामध्ये दोन कमले, खट्‌वांग, त्रिशूल, शंख व कमंडलू -माला अशी आयुधे दिसतात. विष्णु, शंकर, सूर्य आणि ब्रह्मदेवाचे एकत्रित शिल्पांकन असते. याशिवाय लिंगोद्भव शिव या मूर्तीतही ब्रह्मदेवाचे शिल्पांकन असते. शेषशायी विष्णू या शिल्पांमध्ये विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळावर बसलेली ब्रह्मदेवाची छोटी प्रतिमा दिसते. तसेच वामन त्रिविक्रम या शिल्पातही विष्णूने स्वर्ग व्यापायला उचललेल्या पायाशी ब्रह्मदेवाची मुर्ती दिसते. 
 
चित्र क्र. २६ : ब्रह्मेशानजनार्दनार्क, देलमाल 

ब्रह्म देवाची चार मुखे ही चार वेद, चार उपवेद (आयुर्वेद, धर्नुवेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद) चार युगे, चार ऋत्विज (होता, उद्‌गाता, अद्वर्यु आणि ब्रह्मा स्वतः), चार धर्म (विद्या, दान, तप आणि सत्य), चार आश्रम, चार यज्ञद्वय (षोडशी आणि उक्थ, चयन आणि अग्निस्तोम, आप्तोर्याम आणि ऐतरात्र, वाजपेय आणि गोसव), चार दिशा अशा अनेक गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात. (भागवत पुराण ३,१२,३४-४१)

   दक्षिण भारतामध्ये आढळणाऱ्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीना दाढी दिसत नाही आणि काही ठिकाण पायापाशी हंस देखील नसतो.

८. प्रमुख देव विष्णू

चित्र क्र. २७: विष्णु, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली

   ऋग्वेदामध्ये विष्णू ही प्रमुख देवता नाही, असे सर्व अभ्यासकांचे मत आहे. वेद काळामध्ये प्रमुख उपास्य देवतांमध्ये इंद्र, वरुण, अग्नि आदी देवांचे उल्लेख येतात. तसेच अन्य देवतांमध्ये रूद्र आणि विष्णू यांची गणना होते. महाभारतामध्ये विष्णूचे बरेच उल्लेख येतात आणि नंतरच्या काळामध्ये विशेषतः भक्तिमार्गातील विष्णू ही एक प्रमुख देवता झालेली आपल्याला दिसते. या काळात वासुदेव, संकर्षण (बलराम) यांचे प्रतिमा रूपात पूजा सुरू झाली. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकातील नाणे घाटातील शिलालेख, बेसनगरचा शिलालेख, घुसुंडी (राजस्थान) येथील शिलालेख यात हे उल्लेख आढळतात. परंतु या काळातील एकही मंदिर किंवा मूर्ती न सापडल्यामुळे याचे शिल्पांकन कसे असावे हे सांगता येत नाही. इ.स. पूर्व पहिल्या शतकातील बलरामाचे एकच शिल्प सापडले आहे. कुषाण कालानंतर विष्णूच्या प्रतिमा या गुप्त काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या प्रारंभा पासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पूर्णपणे विकसित झालेल्या दिसतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे गुप्त राजे हे स्वतः वैष्णव धर्माचे अनुयायी होते आणि ते स्वतःला परमभागवत म्हणत असत. या काळात घडविलेल्या मूर्ती मोठ्या संख्येने सापडलेल्या नसल्या तरी कलात्मकदृष्ट्या खूपच सरस होत्या. याचे कारण असे की याच कालखंडामध्ये देवदेवतांच्या मूर्तीचे प्रमाणीकिकरण निश्चित केले असल्यामुळे मूर्तिकलेला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. गुप्त राजांच्या सार्वभौम राष्ट्र या संकल्पनेनी सर्व देश प्रभावित झाला होता. याच राजांच्या दरबारात प्रख्यात कवी, नाटककार कालिदास होता मानले जाते. या काळातील विशेषतः शिल्पकलेला आलेली परिपक्कता आणि प्रगल्भता ही ती काळामध्ये ध्वजगजाप्रमाणे मार्गदर्शक ठरलेली आहे. हा प्रभाव इतका खोलवर होता की तेराव्या शतकामध्ये झालेल्या मुस्लिमांच्या आक्रमणांमुळे लयास जाईपर्यंत गुप्त काळातील ही मार्गदर्शक तत्व टिकून होती. याबद्दल आनंदकुमारस्वामींसारखे थोर अभ्यासक असे म्हणतात, "इथे आपल्या आधीच्या काळातील आदिम गुणधर्म आणि तदअनुशंगानी येणारा अभिव्यक्तीमधला भाबड़ेपणा संपलेला होता. एकीकडे त्याचे आत्मसंतुलित सुसंस्कृत आणि काटेकोर शास्त्राने बध्द नियमावलीत बसवलेले स्वरूप असले तरीही दुसरीकडे अभिव्यक्तीमध्ये जीवनोन्मादाने भरलेला उल्हासित प्रकटीकरण दिसते. या काळापर्यंत किंवा आधीच्या काळातील असणारे परकीय प्रभाव पचवले गेले होते, एव्हढेच नाही तर त्यांचे पूर्ण भारतीयकरण झाले होते. प्राचीन काळापासून प्राप्त केलेल ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान हे कलेच्या अभिव्यक्तीशी तादात्म्य पावलेले दिसते. अनंतक ध्यासातून उमगलेले व अनुभूत झालेल्याचेच हे स्थूलीकरण होते. ज्ञानेंद्रीये ही ज्ञान प्राप्तीची कवच असली तरीही बुद्धीचे उन्नयन करून आत्मज्ञानाचीही प्रवेशद्वारे आहेत. कला ही तत्त्व आणि पार यांच्यातील संवाद साधणारा समान दुवा झाल्यामुळे हीच कला अमूर्त (प्रतीकात्मक) तरीही इंद्रियगर सांकेतिक तरीही भावोत्कट झालेली दिसते." (कुमारस्वामी : १९६९, पृ.४५) 
     वरील विधानांचे मूर्तिमंत पुरावे आपल्याला गुप्त काळातील अवशेषांमध्ये दिसतात. देग (म.प्र.) इथे दशावतारांच्या दहा मंदिरांचा समूह होता असे म्हणतात. त्या ठिकाणी सध्या एक छोटेखानी मंदिर अस्तित्वात आहे. या मंदिरावरील शिल्पकला मात्र अत्यंत विलोभनीय आहे. विष्णुच्या वेगवेगळ्या रूपांचे इथे शिल्पांकन दिसते. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वाराभोवती नंद आणि यशोदा हे बाल बलराम आणि बाल कृष्णाला घेऊन उभे आहेत असे विलोभन शिल्प आहे. त्याच दाराच्या तुळईवर बेटोळे घातलेल्या शेषावर बसलेल्या विष्णूचे शिल्प आहे, त्या नरसिंह व वामन नमस्कार करतांना दाखविले आहेत. देवळाच्या उत्तर भिंतीवर शेषशाही विष्णु संभवतः भारतातले सर्वोत्तम असे शिल्प आहे. यामध्ये उजवा पाय किंचित दुमडलेल्या अवस्थेत उचललेला आणि डावा पाया सरळ अशा स्थितीत सात मुखाच्या शेष्याच्या बेटोळ्यावर पहुडले विष्णूचे शिल्पांकन आहे. या विष्णूला चार हात असून त्याचा वरचा डावा हात त्याने दुमडून उशीसार डोक्याखाली घेतला आहे, आणि खालचा डावा हातही दुमडलेला असून तो शेष्याच्या मंचकावर टेकवलेला त्याचा वरचा उजवा हात दमडलेला असून तो शेषाच्या एका मुखापाशी आहे. तर त्यान उजवा खालचा हात हा त्याच्या शरीरालगत सरळ असून त्याच्या उजव्या मांडीवर टेकलेला आहे. त्याच्या पायाशी त्याची पत्नी लक्ष्मी किंवा भूदेवी बसलेली आहे. ती तिच्या उजव्या हाताने त्याच्या उजव्या पायाची बोटे मुडपते आहे आणि त्याच्या किंचित उचललेल्या उजव्या पायाखालून तिने तिचा डावा हात घातला असून ती त्याच्या उजव्या पायाची पोटरी हलकेच दाबून देते. तिच्या मागे एक चवरीधारी दासी उभी असून दासीच्या शेजारी डावीकडे गळ्याभोवती गुंडाळलेल्या सर्पाची मान धरलेला मनुष्यरूपी गरुड उभा आहे. शिल्पाच्या वरच्या भागात मधोमध कमळावर पद्मासनात बसलेला चार मुखांचा ब्रह्मदेव आहे. ज्याचा उजवा हात अभय मुद्रेत असून त्याच्यात त्याने अक्षमाला धरलेली आहे. त्याच्या डाव्या खांद्यावर त्याने मृगाजिन (मृगाचे कातडे) घेतलेले आहे. कमळाचे देठ खाली उतरलेले असले तरी ते विष्णूच्या नाभीतून उतरताना दाखवलेले नाही. ब्रह्मदेवाच्या उजवीकडे हत्तीवर इंद्र आणि मोरावर कार्तिकेय (ईशान) असून त्याच्या डावीकडे नंदीवर शिव, पार्वती आणि त्याच्या पलीकडे एक किन्नर गंधर्व दाखवलेला आहे. सर्पाच्या वेटोळ्या-खालील भागामध्ये डावीकडून पाहिल्यास पहिल्या दोन व्यक्ती मधू आणि कैटभ हे दोन राक्षस आहेत (यांनी वेद चोरल्यामुळे विष्णूने हयग्रीव, घोड्याचे तोंड असलेल्या रूपात प्रकट होऊन त्यांना मारले आणि वेद परत मिळवले). या दोघांनी उजव्या हातात तलवार धरली असून त्यांचे डावे हात कमरे वर ठेवले आहेत. ह्यांच्या पलीकडे विष्णूची आयुधे चक्र, शंख पद्म, गदा, ही मनुष्य रूपात दाखवली असून पहिली व्यक्ती चक्रपुरुषा ऐवजी खडगपुरुष आहे, दुसरी व्यक्ती शंखपुरुष, तिसरी व्यक्ती पद्मपुरुष आणि शेवटी एक स्त्री दाखवली असून ती विष्णूची कौमोदकी नावाची गदा आहे. गदा हा स्त्रीलिंगी शब्द असल्यामुळे आयुधपुरुषांमध्ये ती स्त्री रूपाने दिसते. या शिल्पात वैशेषिक दर्शनामधील काळ संकल्पनेचे यशस्वी शिल्पीकरण केले असल्याचा प्रत्यंतर येतो. (वै.सू. २.२.६ - ९ • ९, संदर्भ राधाकृष्णन : १९९९) काळ विश्वव्यापी (नारायण) असतो, अवकाश व्यापत तो प्रवाही असतो (सर्प). त्याच्या उदरातून ब्रह्मांडाची उत्पत्ती होते (ब्रह्मदेव). याच्या पश्चिमेकडील भितींवर नरनारायण यांचे शिल्प आहे. या शिल्पामध्ये एक वयस्क व्यक्ती आणि त्याच्या शेजारी एक तरुण बसलेला दाखवला आहे. याला नरनारायण असे संबोधले गेले आहे याच देवळाच्या दक्षिण भिंतीवर गजेन्द्रमोक्षाच्या कथेचे शिल्पांकन आहे.
चित्र क्र. २८ : शेषशायी विष्णू, देवगड
चित्र क्र. २९ : नरनारायण, देवगड
चित्र क्र. ३० : गजेंद्रमोक्ष, देख

    शेषशायी विष्णूचे स्वतंत्र मंदिर गुजरातमधील वाळम येथे होते. परंतु आक्रमकांनी ते मंदिर पूर्ण उद्ध्वस्त केले असल्यामुळे सध्या तेथे मंदिराचे अवशेष स्वरूप दोन चार मोठे दगड पडलेले दिसता या मंदिरात विष्णूच्या चोवीस मूर्ती होत्या त्या पैकी अठरा मूर्ती भग्नावस्थेत सापडल्या होत्या बडोद्यातील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच कर्नाटक मध्ये श्रीरंगपट्टण येथे शेषशायी विष्णूचे मंदिर आहे. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे त्याचे मूळ रूप पूर्णपणे बदलेले आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये वीस फुटाहूनही अधिक लांबीची शेषशायी विष्णूची मूर्ती असून तेथे आज पूजाअर्चा आणि अन्य कर्मे सुरू आहेत. इ.स. २०१३ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अतिग्रे गावाती तलाव दुष्काळामुळे आटला होता त्यात एका विहिरीचे अवशेष आढळले. त्यात शेषशायी विष्णु शिल्प आढळले. त्यामुळे या वास्तूचे गूढ वाढले आहे. याचा काल निश्चित नाही.
     गुजरातमध्ये पाटण (पूर्वीचा मेहसाणा जिल्हा, सध्याचा पाटण जिल्हा) येथे सहस्रलिंग तलाव नावाचे स्थान आहे. या परिसरामध्ये सहस्रलिंग शिवाचे मोठे मंदिर आणि त्याभोवती अनेक मंदिवि समूह होता. (सहस्रलिंग म्हणजे शिवलिंगाच्या पिंडीवर छोट्या छोट्या इंग्रजी १ प्रमाणे १००० खुणा केलेल्या असतात. छोट्या खुणा म्हणजे शिवलिंगाचे छोटे रूप.) हा संपूर्ण परिसर प्रबंड गोल पाण्याच्या बांधलेल्या तलावांनी सुशोभित केलेला होता आणि त्या तलावांमध्ये कारंजीही होती. या परिसरामध्ये आज काही विशाल तलावांचे वाळलेले अवशेष आणि काही देवळांन पायथ्याचे अवशेष एवढेच शिल्लक राहिलेले आहेत. याच परिसराच्या शेजारी एक प्रचंड मोठा चिखलाने भरलेला आयताकृती खड्डा होता. त्याच्या एका बाजूला विहिरीसारखी गोलाई आलेला एक भाग थोडाफार दिसत होता. १९६० नंतर याच्याकडे पुरातत्त्व खात्याचे लक्ष गेले. त्यांनी तेथील थोडा बिखल काढून खालील वास्तूचा शोध घेण्याचे ठरवले. याचे कारण असे की त्याच पाटण गावा- मध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बरोटची बावडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बावडीचे बांधकाम झाले. ते करण्यासाठी काढलेल्या दगडांची ही खाण आहे असे स्थानिक लोकांनी सांगितले. 
चित्र क्र. ३१: रानी की वाव, पाटण

१९६० साली सुरू झालेल्या या उत्खननात जसा जसा या खड्यातला चिखल निघू लागला तसे आतून एक महान आश्चर्य उजेडात येऊ लागले. तो एक खड्डा जमिनीखाली बांधलेली बावडी समान वास्तू आहे हे उघडकीस येऊ लागले. पूर्व पश्चिम अशा पसरलेल्या या वास्तूच्या पश्चिमेकडील टोकाला संपूर्ण गोलाकार असलेली एक विहीर आणि त्याला जोडलेला लंबायताकृती हा उरलेला भाग असा याचा आकार आहे. आणि पूर्वेकडून प्रवेश केल्यावर सुमारे पंचवीस पंचवीस फुटाचे क्रमशः उतरत जाणारे चौथरे ज्याची विहिरीतल्या गोलाकार आकारापाशी पोचल्यावर एकूण खोली ही जवळ जवळ सत्तर फूट असून सात मजल्यां-मध्ये विभागलेले आहे. याचे उत्खनन करताना खालील गाळामध्ये पाणी ओतून त्याचा चिखल केला जाई आणि हा चिखल हाताने टोपलीत भरून बाहेर टाकला जाई यामुळे या उत्त्खननासाठी कुठलेही टोक असलेले शस्त्र वापरले गेले नाही. या वास्तूतील सर्व अवशेष मातीत गाडले गेले असल्यामुळे आणि सावध उत्खनन केलेले असल्यामुळे यामध्ये असलेल्या शिल्त्यांना धक्का लागलेला नाही आणि जवळ जवळ ९० टक्के शिल्पे ही सुस्थितीत सापडली. अनेक शतके मातीत गाडली राहिल्यामुळे त्या शिल्पांवर क्षारांचे थर चढल्यामुळे या शिल्पांच्या सौंदर्याला उणेपणा आलेला दिसतो परंतु त्यातील कलाकाराची प्रतिभा मात्र मूळ तेजातच झळाळून उठता दिसते. १९८६ पर्यंत या वास्तूच्या पुनर्निर्माणाचे काम चालले होते.या वास्तूच्या आतील भिंतींवर आणि विहिरीसारख्या गोलाकाराच्या आतील बाजूस पाचशेहून अधिक शिल्पे आहेत ज्यांची मांडणी एखाद्या मंदिरांच्या बाहेरील भिंतींवर केलेली आढळते अशीच आहे. आतील हे मूर्तिकाम आणि विहिरीच्या गोलाकारातील देवतांची रचना पाहिल्यावर हे विष्णुमंदीर असावे असे काही विद्वानांचे मत आहे. (मनकोडीः १९९१, पृ. २)
चित्र क्र. ३२ : रानी की वाव मधील शिल्पे

  विहिरीचा गोलाकार भाग आयताकृतीला जिथे मिळतो तिथे प्रत्येक मजल्यावर प्रवेशद्वार केले आहे. आयताकृती भागातून विहिरीत प्रवेश करण्यासाठी जणू हे द्वार आहे आणि या भागाची रचना देवळातील अंतराळाप्रमाणे आहे. सुमारे २०० फूट लांब आणि ८५ फूट रुंद पसरलेल्या या आयताकृती खड्याच्या लांब बाजूच्या भिंती मातीच्या रेट्याने आत कोसळू नये म्हणून त्यांना जोडणारे तीन आडव्या व्हरांडा रूपी बांधकामाने बळ दिलेले दिसते. हे सुमारे ६ फूट रुंदीचे असून वाढत जाणार खोलीप्रमाणे वाढीव मजल्यांचे बांधकाम आहे. अत्यंत कोरीव अशा स्तंभांभोवती आडव्या तुळ्या रचून केलेले हे बांधकाम बाजूच्या भिंती मातीच्या रेट्याने खचू नये म्हणून कल्पकतेने केले आहे. वास्तूच्या विहिरीसारख्या गोलाकारात प्रत्येक मजल्याच्या प्रवेशदाराच्या रेषेमध्ये आणि बरोबर समोर विष्णूचे शिल्प बसवलेले आहे. ज्यामध्ये खालील तीन अर्धगोलाकार थरावर शेषशायी विष्णूचे शिल्प आहे. या वरून हे शेषशायी विष्णूचे मंदिर असावे वाटते. शेषशायी विष्णूचे शिल्प हे साधारणतः मंदिरांमध्ये पूर्व-पश्चिम बसवलेले असते. आणि या बहुतांश शिल्पांमध्ये जशी पाय चुरणारी लक्ष्मी दिसते. तसेच विष्णूच्या नाभीतून उगविणाऱ्या कमळावर ब्रह्मदेवाचे शिल्प असते. श्रीरंगपट्टण येथील मंदिरात शेषशायी विष्णूचे पूजन होते, तिथे ही मूर्ती उत्तर दक्षिण पसरलेली आहे असे लक्षात येते. त्यामुळे त्या मूर्तीत दोन ठळक गोष्टी दिसतात. पहिली म्हणजे नाभीतून निधणाऱ्या कमळाचे किंवा त्यावरील ब्रह्मदेवाचे शिल्पांकन नाही आणि विष्णू झोपलेला नसून डोळे उधडून जागा असल्याचे शिल्पांकन आहे. पाटण येथील या वास्तूमध्ये शेषशायी विष्णूचे असेच शिल्पांकन दिसते की ज्यात ब्रह्मदेव क्रमशः लहान होत जाऊन सर्वात खालच्या थरातील मूर्तीमध्ये लुप्त झालेला आहे आणि विष्णूनी डोळे पूर्णपणे उघडलेले आहेत. हे शिल्प केवळ उत्तर दक्षिण अशा रचनेत आहे असे नाही तर ते विहिरीच्या गोलाकार अंतर्भागात आहे. अन्य मंदिरात हे शिल्प पूर्व पश्चिम असताना निद्रिस्त विष्णू दाखविण्याचे कारण असे की एकदा हे ब्रह्मांड निर्माण केले की विष्णू परत निद्रिस्त होतो अशी त्याची कल्पना केलेली आहे. विष्णुपुराणात (३.८.१०-१२) असे म्हटले आहे की, ब्रह्मांड निर्माण करण्यापूर्वी विष्णू योगनिद्रेत असतो. त्याची कलाशक्ती जागृत होऊन तो एक हजार महायुगे झोपतो. हा त्याच्या एका निमिषाचा (डोळ्याच्या एका उघडझापीचा) काळ आहे. ज्या वेळेस ह्या सृष्टीचा -हास होतो तेव्हा विष्णू परत जागा होतो. या स्थिती मध्ये अवकाश प्रवाहही होते आणि काळ थांबतो. आधुनिक शास्त्र सांगते की, कृष्णविवरांमध्ये हीच अवस्था येते (आपटे: २००२, पृ. ६२). उत्तर दक्षिण विष्णू झोपलेला असताना सृष्टीचा -हास झालेला आहे म्हणजे सूर्य आता उगवत किंवा मावळत नाही म्हणून विष्णू जागा झालेला दिसतो. विहिरीच्या गोलार्धात हे शिल्प कोरून या ठिकाणी अवकाशाचे अवगुंठन झालेले आहे हे कलाकाराने सूचित केले आणि त्यासाठी एका विवरामध्येच हे शिल्प कोरून त्याने वैज्ञानिक सत्य प्रस्थापित करायचा प्रयत्न केला असावा असे वाटते. संपूर्ण सृष्टीचे सूक्ष्म कणात अवगुंठन झालेले असले तरी त्याही अवस्थेतही श्रीविष्णूचे अस्तित्व असते.
चित्र क्र. ३३ : शेषशायी विष्णु, पाटण

अवतार मूर्ती आणि त्यांची व्युत्पत्ती

     सर्वसाधारणपणे विष्णूचे दहा अवतार आहेत असे मानले जाते. यामध्ये प्रामुख्याने मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे आहेत. परंतु ही संख्या एवढीच सीमित नाही. तर ती वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये कमी-जास्त होताना आढळते. ही संख्या १०, १५, २०, २२ नाही तर सात्वत संहितेमध्ये ३९ अवतारांची नावे आढळतात.यामध्ये गौतम बुद्धांचाही समावेश केल्याचा दिसतो. प्रचलित दशावतारांपैकी पहिले पाच अवतार हे विष्णूचे दैवी दर्शवितात. पुढील अन्य अवतार हे मानवी अवतार आहेत.
चित्र क्र. ३४: बुद्धावतार, पाटण

मत्स्यावतार :-
    मत्स्यावतार हा पहिला अवतार मानला जातो.। अवताराची मंदिरे मात्र आढळत नाहीत. याची पहिली कथा शतपथ ब्राह्मण ग्रंथात येते. हस्त प्रक्षालन काळ मनूच्या हातात एक छोटा मासा पडतो. तो त्य वाचवण्याची विनंती मनूला करतो. त्याच्या बदल्यात प्रलयकाळी वाचवायचे वचनही देतो. जसजसा तो मासा मोठा होऊ लागतो तसा मनू त्याला मोठ्या भांड्यात ठेवत जसे मग तो टाक्यातही मावेनासा होतो तेव्हा त्याला तो समुद्र नेऊन सोडतो. तो देवमाशाएवढा मोठा होतो. त्याचे नाव झ्द. तो महाकाय मासा मनूला एक मोठे जहाज बांधायला सांग आणि पुढे होणाऱ्या प्रलयाची अचूक वेळही सांगून ठेवतो. त्याच वेळेस नंतर प्रलय होतो आणि सर्व पृथ्वी जलमय होते. मनू सर्व मानवांना आणि प्राणिमात्रांना बरोबर घेऊन त्यात चढतो आणि ते जहाज माशाला दोराने बांधतो. तो मासा ते जहाज ओढत नेऊन उत्तर दिशेला असणाऱ्या ऊंच डोंगरामा सुरक्षित स्थळी सोडतो. अशा त-हेने विष्णूने मत्स्य रूप धारण करून प्रलयात बुडालेल्या पृथ्वीवरील जीवांना वाचवले.

 
चित्र क्र. ३५: कल्की, पाटण

कूर्मावतार :- 

   अथर्व बेद, शतपथ ब्राह्मण, वाजसेनीय संहिता इत्यादी ग्रंथांमध्ये कश्यप किंवा कूर्म या नावांचे त्याचा उल्लेख येतो. परंतु इथे विष्णूचा अवतार म्हणून नाही तर ब्रह्मांड, सूर्य किंवा काल असा संदर्भ दिसतो, रामायण आणि महाभारतात समुद्रमंथनाची कथा येते. भागवत पुराणात हीच कथा तपशिलासह दिली आहे. सागराचे मंथन केल्यास त्यातून अमृत मिळू शकेल असे ब्रह्मदेवाने सांगितले हे एकट्या देवांना शक्य नव्हते म्हणून त्यांनी दैत्यराज बळीला मदतीचे आवाहन केले. अमृतप्राप्तीसा तोही तयार झाला. मंदर पर्वताची रवी केली त्याभोवती बासुकी नागाची दोरी गुंडाळली. मंदार पर्वत व जड असल्यामुळे तो बुडू लागला तेव्हा श्रीविष्णूने कूर्माचे रूप घेऊन समुद्रात बुडी मारली आणि महाकाय रवीला आधार दिला. त्या मंथनातून अनेक रत्ने निघाली आणि शेवटी अमृतकलश प्रकटला. देवांनी त्यातील अमृतं दानवांना द्यायला नकार दिला. तेव्हा दानवांनी तो पळवला. मग विष्णूने मोहिनी रूप घेऊन तो परत मिळवला. पूर्ण कूर्म, अर्ध कूर्म आणि कमरेपासून बर पुरुष रूपातील विष्णू, किंवा समुद्रमंथनात मध्यभागी असे या अवताराचे दर्शन मंदिरांमधील शिल्पात किंवा शिल्पपटात होते. तसेच मोहिनीराज रूपातील विष्णूचे मंदिरही आहे.

वराहावतार :-

   वराहाचे उल्लेख ऋग्वेद, तैत्तिरीय संहिता, कपिष्थल कथा संहिता, शतपथ ब्राह्मण, वायुपुराण यासारख्या ग्रंथात आढळतात. वराहावताराची कथा हरिवंशात येते. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वी बुडवली तेव्हा विष्णूने वराहाचा अवतार घेतला, हिरण्याक्षाचे दमन केले आणि पृथ्वीला बाहेर काढले. गुप्त काळातील हे एक अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. वराहाच्या रूपात विष्णू, चतुर्भुज किंवा अधिक भुजा असणारा पुरुष त्याचे मुख केवळ वराहाचे, त्याच्या पायाखाली दानव आणि हातावर पृथ्वी जिने त्याच्या मुखाभोवती हात घालून विळखा घातला आहे असे शिल्प अनेक मंदिरात दिसते. याला भूवराह किंवा नृवराह म्हणतात. याशिवाय पूर्ण रूपातील वराहाचे शिल्प पण दिसते. त्याला यज्ञवराह म्हणतात. खजुराहोमध्ये लक्ष्मण मंदिराच्या समोर एका मंडपात याचे भव्य शिल्प आहे.
चित्र क्र. ३६ वराहावतार, पाटण

नृसिंह :-

     या अवताराचा समावेश विष्णूच्या अवतारांमध्ये कसा झाला असावा याबद्दल स्पष्टता नाही. तैत्तिरीय आरण्यक, महानारायण उपनिषद यामध्ये सिंहरूपी देवाचे वर्णन आढळते. अवतारकथा विष्णू पुराणात अगदी थोडक्यात तर हरिवंशात थोडी विस्ताराने येते. प्रचलित आणि रूढ असलेली प्रल्हादाची कथा भागवत पुराणात आढळते. हजार वर्षे तप करून हिरण्यकशिपु या दैत्यांच्या सम्राटाने ब्रह्मदेवाची उपासना करून त्याला प्रसन्न केले आणि मृत्यू न येण्याचा एक विचित्र वर मागितला. ज्यामध्ये देव, दानव किंवा प्राणी, हात किंवा शस्त्र, दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर आणि जमिनीवर किंवा हवेत त्याला मरण येणार नाही अशा अटी होत्या. या अटींच्या यादीत मनुष्य नाही. या सगळ्या अटी कोणताही मनुष्य पूर्णच करू शकणार नाही याची त्याला खात्री होती. याचा मुलगा प्रल्हाद मात्र विष्णूचा भक्त झाला. त्याला मारायचा पुष्कळ प्रयत्न हिरण्यकशिपुने केला. परंतु प्रत्येक वेळेला श्रीविष्णूने त्याला वाचवले. एक दिवस हिरण्यकशिपुने त्याला विचारले की, जर तुझा सगळीकडे आहे तर तो या खांबातही आहे का? त्यावर त्या बालकाने हो असे उत्तर हिरण्यकशिपुने चिडून त्या खांबाला लाथ मारली. त्यामुळे तो खांब दुभंगला आणि त्यातून अधां आणि अर्धा पुरुष असा अवतार प्रकटला. हिरण्यकशिपु आणि त्याच्या सैन्याने नृसिंहावर चढवला. तुंबळ युद्ध झाले. देवाने सर्व दानवांना मारले. शेवटी संध्याकाळी, घराच्या उंबऱ्यावा त्याला मांडीवर घेऊन नखांनी त्याचे पोट फोडले. अशा तन्हेने हिरण्यकशिपुने मागितलेल्या करा सर्व अटींची पूर्तता करून नृसिंहाने त्याचा वध केला. मंदिरांमध्ये खांबातून प्रकट होणारा, हिरण्यकशिपुबरोबर लढणारा, एकटा नृसिंह किंवा लक्ष्मी नृसिंह अशी नृसिंहांची शिल्पे आढळतात. स्वतःच्या मांडीवर घेऊन हिरण्यकशिपुचे पोट फाडणारा असे त्याचे सर्वात प्रचलित शिल्प आहे. वाकाटक काळातील नृसिंहाचे दोन मंदिरे रामटेक वे टेकडीवरील राम मंदिराशेजारी आहेत. ज्यामध्ये बसलेल्या नृसिंहाची उत्कृष्ट शिल्पे आहेत.

वामनावतार :-

    तीन पावलात विश्व व्यापून टाकणाऱ्या वामन- त्रिविक्रमाचा उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी आढळतो. शतपथ ब्राह्मण या ग्रंथात त्याची कथा थोडी विस्ताराने दिसते. पुढे तैतिरीय संहिता, रामायण आणि अनेक पुराणात ही कथा येते. दैत्यराज बळीने तिन्ही लोक व्यापून असुरांचे राज्य स्थापन केले. त्या वेळेस भगवान विष्णू वामनाचे म्हणजे एका छोट्या बटूचे रूप घेऊन बळीने आरंभिलेल्या यज्ञात गेले. यज्ञात त्यांनी दान मागितले. तेव्हा बळीने दान म्हणून तो छोटा वामन त्याच्या तीन पावलात जेवढी जागा व्यापेल तेवढी त्याने देवांना देण्याचे मान्य केले. यावर विष्णूने आपले विराट रूप प्रकट केले. पहिल्या पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात स्वर्ग व्याप्त करून टाकला. आता तिसरे पाऊल कुठे ठेवू असे विचारल्यावर बळीने आपले मस्तक पुढे केले. तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात लोटून दिले. याची दोन शिल्पे प्रचलित आहेत. एका शिल्पात छत्रीधारी बटू रूपातील विष्णू असतो. अन्य शिल्पात एक पाय जमिनीवर आणि दुसरा आकाशाकडे उचलेल्या पुरुषरूपी विष्णूचे शिल्प असते. अशा शिल्पात उचललेल्या पायाखाली काही छोटी शिल्पे असतात. ज्यामध्ये दान देण्यासाठी झारीतून पाणी सोडताना बळी दिसतो तर त्याच्या पाठीशी दैत्यांचे गुरू शुक्राचार्य उभे असतात. वामनाची मंदिरे आढळतात. खजुराहोमध्ये वामन मंदिर आहे ज्यात गर्भगृहात वामनमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
चित्र क्र. ३७ वामनावतार, पाटण

मानवी अवतार :-

   दशावतारांमध्ये बलराम, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध हे होऊन गेलेले अवतार आहेत, तर कल्की हा भविष्यकाळात होणारा अवतार आहे. हे सगळे आईच्या पोटी जन्म घेतात आणि मानवी जीवन जगतात. त्यांचे अवतार कार्य संपले म्हणजे इतर मानवांप्रमाणे त्यांचा मृत्यू होतो. या अवतारांपैकी बलरामाचे मंदिर असायचे. इसवी सन पूर्व काळात तशी मंदिरे होती हे काही शीलालेखांवरून कळते. तसे एकही मंदिर मात्र सापडलेले नाही.
     मानवी अवतारांची शिल्पे मात्र अनेक ठिकाणी दिसतात. विष्णूच्या अन्य आयुधांबरोबर त्या त्या अवताराचे विशेष शस्त्र त्याच्या एका हातात धरलेले असते. काही शिल्पात तो सपत्नीकही असतो. बलरामाच्या हातात नांगर, परशुरामाच्या हातात परशु, रामाच्या हातात कोदंड (त्याचे धनुष्य) आणि बाण, कृष्णाच्या हातात सुदर्शन तर अन्य बुद्ध मूर्ती प्रमाणे बुद्ध दिसतो. हातात तलवार घेऊन घोड्यावर बसलेल्या आणि रणांगणावर निघालेल्या स्वाराच्या रूपात कल्कीचे शिल्पांकन आढळते.रानी की बाव हे विष्णूचेच मंदिर असल्यामुळे यातील भिंतींवर अन्य देवदेवतां बरोबरच प्रामुख्याने विष्णूच्या अनेक रूपांचे दर्शन होते.

दशावतार :-

     या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण भिंतीवरील सगळ्यात खालच्या स्तरावर दशावतारांचे सुरेख शिल्पांकन दिसते. उत्तरेकडच्या आणि दक्षिणेकडील भिंतीवर प्रत्येकी सहा मोठे आणि एक लहान असे बौदा देवकोष्ठ आहेत. उत्तरेकडच्या भिंतीवर डावीकडून पाहताना पहिल्या छोट्या देवकोष्ठात विष्णूचे शिल्प आहे. दुसऱ्यात वीस हातांचा भैरव, तिसरे देवकोष्ठ रिकामे आहे, चौथ्या देवकोष्ठात भूवराहाचे शिल्प आहे, पाचवे रिकामे आहे, सहाव्या देवकोष्ठात वामन आणि शेवटच्या देवकोष्ठात कोदंडधारी रामाचे शिल्प आहे. यातील मत्स्य, कूर्म आणि नृसिंह या अवतारांची शिल्पे दिसत न दशावताराच्या रांगेतील पहिल्या रिकाम्या कोनाड्यात मत्स्य आणि कर्मावताराचे एकत्रित शिल्प असे वाटते. तसेच पाचव्या रिकाम्या देवकोष्ठात नृसिंहाचे शिल्प असावे. नृसिंहाचे शिल्पांकन शिल्पपटामध्ये केलेले दिसते. दक्षिणेकडील भिंतीवर डावीकडून उजवीकडे पाहताना पहिल्या देवकोष्ठात नांगरधारी बलराम दुसऱ्यात परशु धरलेला परशुराम, तिसऱ्यात बुद्धाची उभी मूर्ती, आणि चौथ्यात अश्वारूढ कलीचे शिल्प आहे. त्यानंतरच्या देवकोष्ठात वीस हातांची महिषासुरमर्दिनीचे शिल्प आहे. पुढील कोर मोकळा असून शेवटच्या देवकोष्ठात सूर्याची प्रतिमा आहे.

चातुर्विंशती विष्णुमूर्ती :-

    रानी की वावमध्ये एका स्तरावरील शिल्पपटावर विष्णूची चोवीस रूपे कोरली आहेत. शंख, च गदा, पद्म ही विष्णूची प्रमुख लांछने. यांच्या क्रमवार रचनेला विष्णूच्या अवस्थिती असेही म्हणतात. क्रम कुठून सुरू करावा या बाबत मूर्तिशास्त्रांच्या पुस्तकांमध्ये एकवाक्यता नाही. पद्मपुराणात एकवीस नावांचा आणि त्याच्या आयुधांचा उल्लेख येतो तर परमेश्वरसंहिता आणि अहिरबुधन्य संहितामध्ये बाराच नावांचा उलेख येतो. केवळ रूपमंडन् मध्ये सर्व चोवीस नावांचा उल्लेख येतो. काहींच्या खालच्या उजव्या हातापासून सुरुवात करावी असे आहे तर काही शास्त्रात ती विष्णूच्या वरच्या उजव्या हातापासून केलेली दिसते. या चार आयुधांच्या अदलाबदलींची रचना ही एकूण चोवीस प्रकारात होउ शकते. यावरूनच या रचनेप्रमाणे विष्णूची चोवीस नावे होतात. ज्याचे संध्ये मध्ये उच्चारण केले जाते. विष्णूची ही चोवीस नावे या प्रमाणे आहेत.
    केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, हृषीकेश, पद्मनाभ, दामोदर, संकर्षण, बासुदेव, प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, अधोक्षज, नृसिंह, अच्युत, जनार्दन, उपेंद्र, हरी आणि कृष्ण.
चित्र क्र. ३८ : बलराम, पाटण
चित्र क्र. ३९: परशुराम, पाटण
चित्र क्र. ४०: श्रीराम, पाटण

विष्णूच्या अन्य मूर्ती :-

    या मध्ये परविष्णू आणि विभव या प्रकारच्या मूर्तीचा समावेश होतो. याशिवाय विष्णूच्या काही संहार मूर्ती आणि काही गूढ मूर्तीचाही समावेश आहे.अन्य देवता :-
    रानी की बाव मधील शिल्पे जरी प्रामुख्याने विष्णूची असली तरी अन्य सर्व मंदिरांप्रमाणेच अधिष्ठात्री देवतेचे सोडून अन्य देवदेवतांची शिल्पे येथेही कोरलेली आढळतात. ज्या मध्ये ब्रह्मदेव आणि सावित्री, शंकर-पार्वती, गणपती व ऋद्धी, आणि विष्णू-लक्ष्मी अशी देवतांची युगुल शिल्पे येथे आढळतात. यातील लक्षणीय शिल्पे म्हणजे तप करणाऱ्या पार्वतीची विविध रूपे, अठरा हातांचा भैरव आणि अठरा हातांची महिषासुर मर्दिनी, हनुमान आदी प्रमुख देवतांची शिल्पे दिसतात. तसेच अष्टदिक्पाल आणि नद्यांची शिल्पेही दिसतात.

खजुराहो येथील विष्णूचे प्रमुख मंदिर

लक्ष्मण मंदिर :-
    विष्णूची भव्य मंदिरे ही संख्येनी कमीच आहेत. खजुराहो येथील लक्ष्मण मंदिर याचा यामध्ये प्रामुख्याने समावेश करावा लागेल. हे मंदिर चंदेल घराण्यातील राजा यशोवर्मन याने इ.स. ९५० मध्ये बांधले. याच राजाचे लक्ष्मण हेही नाव असल्यामुळे या मंदिराला लक्ष्मण असे नाव दिले गेले. या देवळामध्ये विष्णूच्या वैकुंठ मूर्तीची प्रतिष्ठापना गर्भगृहामध्ये केली गेली होती. ही विष्णूची अत्यंत वेगळ्या प्रकारची मूर्ती असून तिची गणना विष्णूच्या व्यूह मूर्तीमध्ये होते. ही मूती तोंडाची असून तिची तीनच मुखे दृष्य असणारी समोरील मुख हे मानव रूप असून त्याच्या उजवीकडे नृसिंहाचे आणि डावीकडे वराहाचे मुख आहे. 
 
चित्र क्र. ४१ : लक्ष्मण मंदिर, खजुराहो

 
चित्र क्र. ४२ : वैकुंठ विष्णु, खजुराहो

चार व्युहांची नावे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न अनिरुद्ध अशी असतात (या मूर्तीतील अनिरुध्द मागचे तोंड असते). जयाख्य संहितेमध्ये विश् चतुर्वक्त्र रूपाचे ध्यान करण्याची पद्धत दिली. ज्यामध्ये वैकुंठ, नरसिंह, वराह आणि कति उल्लेख होतो. यावरून वरील मूर्तीमध्ये वासुदेव म्हणजे वैकुंठ, संकर्षण म्हणजे नरसिंह, म्हणजे वराह आणि अनिरुद्ध म्हणजे कपिल होतो. ज्ञान, बल, ऐश्वर्य, वीर्य, शक्ती आणि तेजस गुण ईश्वरसाधनेतून मानवाला प्राप्त करावयाचे असतात. वैकुंठ विष्णू मूर्तीमध्ये ज्याचा कल्पकतेने समावेश केला आहे. संकर्षणाकडे ज्ञान आणि बल, प्रद्युम्नाकडे ऐश्वर्य आणि वीर्य, अनिरुद्धाकडे शक्ती आणि तेजस आणि वासुदेवाकडे हे सहाही गुण एकत्रितपणे असतात. याशिवाय या चार व्युहांचे बारा उप व्यूह असतात. ते याप्रमाणे १. केशव, २. नारायण, ३. माधव, ४. गोविंद, ५ विष्णू, ६. मधुसुद्ध ७. त्रिविक्रम, ८. वामन, ९. श्रीधर, १०. हृषीकेश, ११. पद्मनाभ, १२. दामोदर. पांचरात्र संहितेमा विष्णूचे अवतार एकेका व्युहामधून होतात असे म्हटले आहे. उदाहरणार्थ मत्स्य, हयग्रीव आणि कृष्ण अवतार अनिरुद्ध या व्युहातून निर्माण झालेले आहेत.
    भारतीय मूर्तिशास्त्रातील देवदेवतांच्या मूर्तीचे सर्वाधिक आणि विविध प्रकाराचे शिल्पाकंन  खजुराहोमधील मंदिरात पाहायला मिळते. यातील काही मूर्ती तर इतक्या दुर्मिळ आहेत की त्या जगात अन्यत्र कोठेही दिसत नाहीत. खजुराहो मध्ये इ.स. ९०० ते इ.स. १०५० या कालखंडात लहान मोठी अशी ८५ मंदिरे बांधली गेली असे सांगतात. यापैकी आता केवळ दहा बाराच मंदिरे शिल्लक राहिलेत आहेत.
    लक्ष्मण मंदिराच्या बांधकामाने तेथील मंदिर स्थापत्याला एक वेगळा आयाम प्राप्त झाला. कारण या पूर्वी फार मोठी मंदिरे तेथे बांधली गेली नव्हती. या नंतर विश्वनाथ, खंडारीया महादेव आणि वैद्य ही मोठी मंदिरे बांधली गेली ज्यापैकी वैद्यनाथ मंदिराचा केवळ पायाच शिल्लक आहे. लक्ष्मण मंदीर हे भारतीय स्थापत्याच्या परिपूर्ण अवस्थेतील मंदिरांमध्ये गणले जाते. ज्याचे समोरून आत जाताना अर्धमंडप, मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे पाच भाग पडतात, तर खालून वर त्याची रचना जगती, पीठ अधिष्ठान यांचा पाया, त्यावर मंडोवर, जंघा (भिंती) त्यावर उतुंग असे शिखर त्यावर आमलक आणि वरती कलश अशी रचना दिसते (कृष्ण देवः १९६९). याच्या प्रत्येक भागावर क्रमशः उंचीवर जाणारी शिखरे असून गर्भगृहावरील शिखर हे सर्वोच्च आहे. हे मंदिर सुमारे दहा फूट उंचीच्या चौथऱ्यावर बांधले असून त्याची लांबी शंभर फूट, रुंदी सत्तर फूट आणि उंची जवळ जवळ शंभर फूट असे प्रचंड मंदिर आहे. हे खजुराहो जवळ असणाऱ्या केन नदीच्या परिसरातील वालुकापाषाणापासून बांधलेले असून दगडामध्ये दगड अचूकतेने खोचत ज्यात कुठेही चुना किंवा अन्य दगड चिकटविण्यासाठी कुठल्याही माध्यमाचा उपयोग न करता हे बांधले गेलेले आहे. अशा बांधकामांना हेमाडपंती म्हणावयाची प्रथा महाराष्ट्रात आहे याचे कारण इ.स. १३ व्या शतकात यादवांच्या दरबारात असणाऱ्या हेमाद्री पंतांनी लिहिलेल्या ग्रंथात या स्थापत्याचा उल्लेख येतो. यावरून या स्थापत्याचा शोध यांनी लावला असा समज दृढ आहे. परंतु हेमाद्रीपंतांच्या हजार बर्षे पूर्वीपासून हे स्थापत्य अस्तित्वात होते.
चित्र क्र. ४३: हृषिकेश, पाटण
चित्र क्र. ४४ : वासुदेव, पाटण
चित्र क्र. ४५ : लक्ष्मण मंदीर , खजुराहो

लक्ष्मण मंदिर हे विष्णूचे मंदिर आहे. एवढेच नाही तर त्या प्रकारच्या मंदिराचे एक अन्य वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे असे म्हणावे लागेल. या मंदिरात विष्णूच्या विविध रूपातील मूर्तीचे दर्शन होत परंतु त्याच बरोबर विष्णुसंकल्पनेच्या वैज्ञानिक सिद्धान्ताचाही आविष्कार झालेला दिसतो. पाट्ण येथील मंदिरात आपण विष्णू हे कालाचे रूप आहे असे पाहिले परंतु विष्णू हा विज्ञानदृष्ट्या दुहेरी भूमिका साकारणारा देव आहे. तो काळाबरोबरच अवकाशाचेही प्रतिनिधित्व करतो. विष्णुपुराण अबकाश हे त्याचे स्थूल आणि सूक्ष्म रूप तर काळ त्याचे पर रूप आहे, असे म्हटले आहे. (विण पुराण, १.२.१४).
  तदेव सर्वमेवैतद्व्यक्ताव्यक्तस्वरूपवत्।
 तथा पुरुषरूपेण कालरूपेण च स्थितम् ।। (विष्णु पुराण, १.२.१४)
    "तो पुरुष आणि काल रुपात असतो. पुरुषाची व्यक्त (स्थूल) आणि अव्यक्त (सूक्ष्म) अशी दोन रूपे असतात आणि काल त्याचे पर रूप होय." (विष्णु पुराण, अनुवाद विल्सन, १८६४, पृ. १८).
      वामन हे या अवकाशाचेच रूप. एक बुटका वामन क्षणात त्रिभुवन व्यापू शकतो हे विष्णूच्या अवकाश व्याप्तीचे दर्शन घडवते म्हणुनच खजुराहोमधील छोट्या मंदिरामध्ये विष्णूचे वामन मंदीरही आहे. या मंदिरातील अधिष्ठात्री देवता वामन असून गर्भगृहात वामनाच्याच बटू मूर्तीची प्रतिष्हाप केलेली आहे. लक्ष्मण मंदिरामध्ये विष्णूचे अवकाश हे रूप साकारण्यासाठी देवालयाबाहेर देवकोष्ठांमध्ये नवग्रहांचे मानुष रूपातील शिल्पांकन पाहायला मिळते. गर्भगृहाच्या समोरून पाहताना डावीकडच्या द्वारशाखेवर खालून वर पाहताना मत्स्य, वराह, बामन या क्रमाने शिल्पे असून उजयी-कडील द्वारशाखेवर कूर्म, नरसिंह आणि परशुराम यांची शिल्पे आहेत. मंदिरातील गर्भगृहाबाहेरील दक्षिणेकडील देवकोष्ठात वराह अवतार, पश्चिमेकडील (मागच्या बाजूकडील) देवकोष्ठात नरसिंह अवतार आणि उत्तरेकडील देवकोष्ठात हयग्रीव अवताराच्या मूर्ती दिसतात. ह्या तीनही मूर्तीच्या वरील उपकोष्ठामध्ये विष्णूच्या तीन अत्यंत दुर्मिळ मूर्ती आहेत. बराह अवतारावरील कप्प्यात कूर्मावरील विष्णुयोगेश्वराचे कूर्मनारायणाचे, नरसिंहावरील कप्प्यात विष्णुयोगेश्वराचे विष्णूनारायणाचे, तर हयग्रीवावरील उपकोष्ठात मत्स्यावरील विष्णुयोगेश्वराचे मत्स्य नारायणाचे शिल्पांकन आहे. ही शिल्ये भारतात अत्यंत पवित्र अशा मानल्या गेलेल्या ज्ञानाची आणि ज्ञान परंपरेची प्रतीके आहेत.
चित्र क्र. ४६ : वामन, खजुराहो

लक्ष्मण मंदिरातील विशेष शिल्पे

ज्ञान परंपरेचे महत्त्व :-
    आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा आहे असा सहज उल्लेख केला जातो. परंतु खजुराहोमधील शिल्यांकन पाहिल्यावर गुरुशिष्य ही आपली परंपरा नसून ती शिक्षण पद्धती आहे. परंपरा ही ज्ञानाची किंवा ज्ञानार्जनाची आहे. हे ज्ञान अति पवित्र असते. त्यामुळे ते सगळ्यांना वाटायचेही नसते. इति गुह्यतमं शास्त्रं असे पंधराव्या अध्यायात भगवंताने म्हटले आहे. खजुराहोच्या संग्रहालयामध्ये या वाक्याचे प्रतिनिधित्व करणारे एक अत्यंत दुर्मिळ शिल्प आहे. पद्मासनात बसलेल्या विष्णूने आपल्या डाव्या हाताची तर्जनी तोंडावर ठेवलेली आहे. हे विष्णूनारायणाचे गोप्ता किंवा मौन-व्रती (रहस्यधारी, गुप्तता पाळणारा) हे रूप आहे. अठरा अक्षौहिणीचे विराट सैन्य सभोवती होते त्यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि ज्ञानीही होते. संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान सांगणारे साक्षात भगवंत तेथे होते, तरीही श्रोता मात्र एकच होता. हे ज्ञान एकाने एकालाच द्यावयाचे असते हा संकेत होता.
कूर्म नारायण :-
    समुद्रमंथनाच्या प्रसंगी विष्णूने कूर्माचे रूप घेतले आणि त्या वेळेस त्याने नारदाला काही ऋषींच्या उपस्थितीत ते दिव्य ज्ञान दिले. या शिल्पामध्ये हा प्रसंग दाखवला आहे. कुर्मावरील विष्णू चार हातांचा असून तो पद्मासनात बसलेला आहे आणि त्याचे नैसर्गिक दोन हात ध्यान मुद्रेत आहेत आणि वरील डाव्या उजव्या हातात अनुक्रमे चक्र आणि गदा आहेत. त्याच्या समोर हात जोडून नारद आणि काही तपस्वी बसलेले आहेत. आणि विष्णूच्या मागे सहा ऋषी उभे आहेत.

चित्र क्र. ४७ :कूर्मनारायण, खजुराहो

मत्स्य नारायण :-
   महाप्रलयामध्ये संपूर्ण सृष्टीचा विलय झाला, त्या वेळेस विष्णूने मत्स्याचे रूप घेऊन वैवस्वत मनू आणि सप्त ऋषींना वाचवले. या शिल्पपटात वरील प्रमाणेच ध्यानस्थ विष्णूची पद्मासनातील मूर्ती असून त्याच्या मांडीखाली आसनावर लांब मासा कोरलेला दिसतो. शेजारी अत्यंत वयोवृद्ध मनू हात जोडून बसलेला आहे. ज्याच्या सोबतीला दोन सेवक आहेत. या शिवाय विष्णूच्या मागे सहा उभे आणि पायाशी एक बसलेले असे सात ऋषी - अत्री, वशिष्ठ, कश्यप, गौतम, भारद्वाज, विश्वामित्र आणि जमदग्नी आहेत, ज्यांना सप्तर्षी असे संबोधले जाते.

चित्र क्र. ४८ : मत्स्यनारायण, खजुराहो

विष्णु-नारायण :-
   याचा उल्लेख महाभारतातील एका कथेत येतो. एकदा एकत, द्वित आणि त्रित ह्या नावाचे तीन त्रि शिखंडीन संन्यासी साधू नारायणाचे दर्शन घेण्यासाठी त्याच्याकडे म्हणजे श्वेत द्वीपावर गेले, तेजोमय वातावरणाने त्यांचे डोळे दिपले आणि दृष्टी गेली. त्यांनी तेथे शंभर वर्ष घोर तपस्या केली, ज्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे त्यांना तिथल्या नारायणाच्या साधनेत असलेल्या तेजःपुंज तपस्वींचे दर्शन झाले. अचानक एक प्रखर प्रकाशाचा झोत प्रकटला आणि रमः असे म्हणत ते श्वेत द्विपवासी हात जोडून तिकडे धावले. या तिघांना साक्षात नारायण प्रकटले असल्याचे समजले. परंतु अति जर्जर झाल्यामुळे ते तिकडे जाऊ शकले नाहीत किंवा त्याला पाहू शकले नाहीत. त्या वेळेस आकाशवाणी होऊन नारायणाने त्यांना दिव्य ज्ञान दिले, जे घेऊन ते परत आले. या शिल्पपटात पद्मासनात ध्यान मुद्रेत बसलेली विष्णूची मूर्ती असून त्याच्या वरच्या डाव्या उजव्या हातात अनुक्रमे शंख आणि चक्र आहेत. त्याच्या मागे सहा श्वेतद्विपावरील ऋषी उभे असून त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यामागे प्रभावळ दाखवली आहे. दोन्ही गुढघे आणि कमरेभोवती योगपट्ट गुंडाळून देवाकडे पाठ करून बसलेला एक ऋषी आहे ज्याचे शरीर खंगून अस्थिपंजर झाल्याचे दाखवलेले आहे. हा त्या तिघांपैकी एक तर दुसरीकडे दोन श्वेत द्विपवासी यांनी मध्ये होम पेटवून ते त्यात आहुती देत आहेत.

चित्र क्र. ४९: योगनारायण, खजुराहो

कृष्ण लीला :-
      या मंदिरामध्ये एकत्रितपणे अनेक कृष्णलीलांचे मनोहारी शिल्पांकन केलेले आहे. गर्भगृहाच्या भोवती आपल्याला ही शिल्पे दिसतात. ही शिल्पे अन्य शिल्पांच्या मध्ये मध्ये कोरलेली आहेत. डावीकडून प्रदक्षिणेला सुरुवात केल्यास १. तृणावर्तवधाचे शिल्प आहे. हा वादळाचे रूप असणारा राक्षस गवताच्या काड्यांचा वेश घेऊन आला. परंतु कृष्णाने त्यास ओळखले व मारले. २. निमिषारण्यामध्ये बलरामाने रोमहर्षणसुताला मारल्याचे शिल्प आहे. ३. कृष्णाने चाणुराला (कंसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प आहे. ४. कुवलयपीड नावाच्या कंसाच्या हत्तीला कृष्णाने ठार मारल्याचे शिल्प आहे. पश्चिमेकडील (मागील बाजूस)

चित्र क्र. ५० : कृष्णालीला, शकट भंग, खजुराहो

भितीवर ५. कालिया मर्दनाचे यामध्ये मनुष्यरूपी कालिया जो कमरेखाली सर्प रूपात दिसत आहे ठार करतानाचे शिल्प आहे. ६. कृष्णाने शालाला (कसाचा मल्ल) ठार करतानाचे शिल्प त्यानंतर कृष्णाद्वारे कुब्जेचा उद्धार हे शिल्प आहे. ८. शकट भंग - कृष्णाने बैलगाडी तोडताना शिल्प. त्यानंतर उत्तरेकडील भिंतीवरील शिल्पे ९. कृष्णाद्वारे बैल रूपात आलेल्या अरिष्टासुराचा वध केलेले शिल्प आहे. १०. त्यानंतर यमलार्जुन वधाचे शिल्प आहे शापित होऊन वृक्ष रूपात अडकले दोन यक्षांना कृष्णाने ते वृक्ष तोडून मुक्त केले. ११. पुढे पूतनावधाचे शिल्प आहे. तर शेवटी वासराच्या रूपात आलेल्या वत्सासुराचा वध करताना कृष्णाचे शिल्प आहे.

खजुराहोतील अन्य विष्णू मंदिरे

वराह मंडप :-
      लक्ष्मण मंदिरांच्या समोरच एका मंडपाखाली महावराहाचे शिल्प आहे. याला स्वतंत्र वराह जरी म्हटले गेले असले तरीही ज्याप्रमाणे शिव मंदिरासमोर नंदी असतो, विष्णू मंदिरासमोर या मूर्ती स्थापना करण्याची पण पद्धत होती. हा मंडप तंतोतंत जरी या पद्धतीत बसणारा नसला हो साधारण प्रयोजन तसेच दिसते. यामध्ये एक विशाल वराहाचे (त्याची लांबी पावणे नऊ आणि पावणे सहा फूट आहे) शिल्प असून त्याच्या अंगावर असंख्य देव कोरलेले आहेत. यज्ञवराह शिल्पाचे नाव आहे. हे विष्णूचे 'सर्वदेवमय' असे रूप असते. या वराहाच्या पायाखाली एक प्रचंड कासव कोरलेले आहे. आणि वराहाच्या पायांमध्ये शेष सर्प कोरलेला आहे. आदी कुर्मावर शेष त्यावर विष्णू अशी या रचनेची संकल्पना आहे. वराहाच्या डाव्या सुळ्याला धरून उभ्या असलेल्या लक्ष्मीची पूर्णाकृती मूर्ती कोरली होती. आज केवळ तिची पावलेच दिसतात. वरच्या तोंडावा सा

चित्र क्र. ५१ : वराह मंडप, खजुराहो

चित्र क्र. ५२ : यज्ञवराह वराह मंडप, खजुराहो

 




९. शिवमुर्तीशास्त्र

केवलमूर्ती :-

   यामध्ये एकटा शिव समभंग अवस्थेत (दोन्ही पायावर सरळ) उभा असतो. या मूर्तिप्रकारात फारसे लालित्य नसते. प्रसंगी त्याच्या मागे नंदीही काडलेला असतो. त्याच्या वरच्या उजव्या हातामध्ये त्रिशूळ व अन्य हातांमध्ये डमरू, सर्प इ. लांछने असतात. वेरुळच्या कैलास मंदिरामध्ये अनेक ठिकाणी याचे शिल्पांकन दिसते.
 भिक्षाटनमूर्ती :-
      पुराणातील एका कथेनुसार शिव-पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत असताना पार्वतीने शिवाचे त्रिभुवनासहीत सर्व वस्त्रेही जिंकून त्याला दिगंबर केले. त्यामुळे शिवाला भिक्षा मागत फिरावे लागले. भिक्षापात्र घेऊन उभा असलेल्या शिवाचे शिल्प अनेक मंदिरांमध्ये आढळते. या मूर्तीला भिक्षाटन शिव असे म्हणतात. वेरुळ येथील कैलासमंदिराच्या मागील (पूर्वेकडील) विथिकेत (व्हरांड्यात) हे शिल्प आढळते. येथे शिवाला भिक्षा वाढणारी स्त्री ही अन्नपूर्णा पार्वतीमाताच असते.

चित्र क्र. ६२: केवल शिव, कैलास मंदिर, वेरूळ

हरिहरमूर्ती :-

     सामाजिक ऐक्यासाठी कोरलेल्या शिल्पांमध्ये याचा समावेश करावा लागेल. शैव आणि वैष्णव यांच्यात उफाळलेल्या संघर्षाला उत्तर म्हणून या मूर्तीची निर्मिती झाली. ही दोन्ही वेगळी तत्त्वज्ञाने नसून एकाच वैदिक तत्त्वज्ञानाची ही दोन अंगे आहेत. ह्या उभ्या मूर्तीमध्ये मूर्तीच्या उजवीकडील अंग हे शिवाचे. उजव्या हातात त्रिशूल, डोक्याच्या अर्ध्या भागावर जटामुकुट आणि त्याखाली कोपऱ्यात नंदी ही शिवाची लक्षणे तर त्यातील शिवाच्या डाव्या बाजूला डोक्यावर विष्णूचा मुकुट, डाव्या वरच्या हातात चक्र, डाव्या खालच्या हातात शंख आणि खाली कोपऱ्यात हात जोडून बसलेला मानवी रूपातील गरुड ही सर्व विष्णूची लक्षणे. कैलास मंदिरातील पूर्वेकडील म्हणजे मागच्या विधिकेतील शिल्पपटात बरोबर मधोमध हे शिल्प कोरलेले आहेत.


विय क्र. ६३: भिक्षाटन मूर्ती, कैलास मंदिर, वेरूळ

वीणाधर शिव :-

     या मूर्तीमध्ये शंकराच्या हातात वीणा दाखवलेली असते. वेरुळच्या कैलास मंदिराभोवताली असणाऱ्या उत्तरेकडील विथिकेमध्ये हे शिल्प आहे. या मध्ये शंकर पार्वती बसलेले दाखवलेले असून, शंकराने हातात वीणा धरलेली दाखवली आहे. काही मंदिरांमध्ये नृत्य मुद्रेमध्ये सुद्धा शिवाने वीणा धरल्याचे दिसते.

चित्र क्र. ६४: हरिहर मूर्ती, कैलास मंदिर, वेरूळ

लिंगोद्भवमूर्ती :-

   शिव मूर्तीच्या शिल्पांकनांचे तीन गट पडतात. व्यक्त, अव्यक्त आणि व्यक्ताव्यक्त. ज्या मूर्ती शारीर रूपात शिव दिसतो त्याला व्यक्त म्हणतात. अव्यक्त रूप म्हणजे शिवलिंग आणि त्याचे प्रकार.
     लिंगोद्भव शिव हे शिवाच्या व्यक्ताव्यक्त या प्रकारात येते. या शिल्पात मधोमध एक शिवलिंग असते ज्यामध्ये एक ज्योतीचा आकार कोरलेला असतो. त्यामध्ये एक उभी मानवाकृती कोरलेली असते जो आयुध विरहित शिव असतो. शेजारी चार मुखी ब्रह्मदेव उभा असतो आणि त्यान डोक्यावर हंसाचे रूप घेऊन तो आकाशात उड्डाण करताना दिसतो. तर शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजुला विष्णु उभा असून त्याच्या पायाजवळ तो वराह रूपाने पाताळात जाताना दिसतो. यांची कथा (शिवपुराण, अ.२ श्लोक ३० ते ५०), एकदा ब्रह्मा आणि विष्णुमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाल त्यांचे भांडण विकोपाला गेले. त्यावेळेस एक प्रचंड मोठी ज्वाला (अग्री स्तंभ) दोघांमध्ये प्रकर दोघांपैकी जो याच्या टोकाचा थांग लावेल तो श्रेष्ठ असे ठरले. हंसाचे रूप घेऊन ब्रह्माने आकाशाचे टोक शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे खालचे टोक शोधायला वराहाचे रूप घेऊन विष्णु पाताळात गेला. त्या दोघांनाही ते टोक काही सापडले नाही परत येऊन भेटल्यावर ब्रह्याने आपल्याला    टोक सापडले असे खोटेच सांगितले. तेव्हा त्या स्तंभातून साक्षात शिव स्वतः प्रकट झाले आणि माझा थांग तुम्हाला लागणार नाही असे सांगितले. खोटे बोलल्याबद्दल ब्रह्माला त्यांनी शाप दिला. शैव पंथाचे माहात्य्य सांगणारे हे कथानक आणि त्याला अनुसरून केलेले हे शिल्प आहे असे सर्वसाधारणपणे मानले जाते.
    परंतु या शिल्पामध्ये काळ अवकाश यांची अथांगता आणि अवकाश-ऊर्जेचे नाते स्पष्टपणे दाखविण्याचा प्रयत्न असावा असेही मत आहे (झिमर: १९९०, पृ.४८-५०). कैलासमंदिराच्या पायऱ्या उजवीकडून चढून जाताना प्रवेशद्वारावरील उजवीकडील भिंतीवर हे शिल्प दिसते.

नटेश अथवा नटराज :-

 शिवाच्या तांडवमूर्ती :- सर्व साधारणपणे कलाकारांचा देव म्हणून परिचित असलेले नटराजाचे धातूचे शिल्प सर्वांना परिचित रूप आहे. शिवाच्या तंडू नावाच्या भक्तापासून या नृत्याची निर्मिती झाली, म्हणून याला 'तांडव' असे म्हणतात. तांडवाचे एकूण १०८ प्रकार असतात. चिदम्बरम (तामिळनाडू) येथील तिल्लई नटराज मंदिराच्या गोपुराच्या (प्रवेशद्वाराच्या) भिंतीवर हे सर्व १०८ प्रकार कोरलेले आहेत. तसेच तामिळनाडूमधल्या कुंभकोणम् येथील शारङ्गपाणी मंदिर, वृद्धाचलम येथील वृद्धगिरीश्वरार मंदिर आणि तिरुवनमलई येथील अन्नमलैयर मंदिराच्या गोपुरावरही हे १०८ प्रकार कोरलेले आढळतात.

कटीसम तांडव :-

    वेरुळमधील रामेश्वर लेण्यात (क्र.२१) याचे अत्यंत श्रेष्ठ असे शिल्पांकन दिसते. यात शंकराचे डावे पाऊल पूर्ण उचललेले असून केवळ त्याची बोटे खाली टेकलेली आहेत आणि उजवे पाऊल अर्धवट उचललेल्या अवस्थेत आहे. त्याच्या वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्नी असून खालचा उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात नृत्य मुद्रेत आहे. कानात कुंडले, गळ्यात कंठी आणि हार, पोटाभोवती उरबंध, हातात कंकणे, दंडावर सर्पकेयूरे व कंबरेत मेखला आहे. त्याने वाघाच्या कातड्याचे वस्त्र नेसले असून त्या वस्त्राच्या टोकाला बारीक वाघनखेही दिसतात. त्या शिल्पाच्या मागील भिंतींवर शिवाच्या डाव्या हाताच्या बाजूला वायू, कुबेर, इंद्र आणि यम हे अष्ट दिक्पालांपैकी चार दिक्पाल आपापल्या वाहनांसहित आहेत आणि शिवाच्या उजव्या हातावर काही आकाशमार्गाने उडणारे तपस्वी आणि गंधर्व आहेत.

चित्र क्र. ६५: कटीसम तांडव, रामेश्वर लेणे, वेरूळ

चित्र क्र. ६६ : तबलावादक महिला, भाजे लेणे

शिवाच्या उजव्या पायाशेजारी तीन वादक असून त्यांच्यावरच्या अंगाला एका हत्तीचे डोके दिसते. तो गणपती आहे. शिवाच्या डावीकडे एक मिशा असलेला पुरुष उभा असून त्याच्या समोर कडेवर बाळ कार्तिकेयाला घेउन एक स्त्री उभी आहे. त्या दासीच्यासमोर शिवाकडे तोंड करून पार्वती बसली आहे आणि पार्वतीकडे तोंड करून वादन करणारी एक स्त्री आहे. तिच्यामागे उभ्या असलेल्या दासीचा चेहरा आणि गळा तेवढाच दिसतो. शिवाच्या पायामध्ये एक छोटा अस्थिपंजर गण (भृंगी)  नाचताना दिसतो.या नृत्य प्रकाराला 'कटीसम तांडव' म्हणतात. नटराजाच्या या शिल्पाची गणना भारतातील श्रेष्ठ शिल्पात केली जाते. 
चित्र क्र. ६७ : साथ करणारे वादक, रामेश्वर लेणे, वेरूळ 
 
किंबहुना नटराजाच्या शिल्पामधील कटीसम मुदे नृत्याबरोबरच भावदर्शन घडविणारे हे सर्वात श्रेष्ठ शिल्प ठरेल. या शिल्पात तांडवाचे सर्व गुणधर्म दाखवत असताना (उत्पत्ती, स्थिती, लय, तीरोभाव आणि अनुग्रह) त्याचबरोबर भारतीय नृत्याचाही फार बारकाव्याने विचार केलेला आहे. शिवाच्या उजव्या बाजूला असलेल्या चार वादकांपैकी दोघीजणी बासरी वाजवताहेत, नृत्याला संगीताची जोड आवश्यक असते. परंतु भारतीय संगीताला तालाची आवश्यकता असते. म्हणून तिथे खोळ (मृदंगासारखे वाद्य) बाजवताना आणि त्याचबरोबर त्यांच्यासमोर चुंबळावर उभे तबल्यासारखे वाद्य अशी ताल वाद्ये वाजवणारा बसलेला आहे. अमीर खुसरो (इ.स.१४वे शतक) याने तबल्याचा शोध लावला असा गैरसमज आहे. तो दूर करण्यास कारण इ.स. च्या सातव्या शतकात तबल्याचे स्पष्ट शिल्पांकन या शिल्पात दिसते. तबला हे वाद्य भारतीय संगीताइतकेच प्राचीन असावे. (भाजे येथील इ.स. पू. दुसऱ्या शतकातील लेण्यांमध्ये एक स्त्री उजव्या हाताने तबला आणि डाव्या हाताने डग्गा वाजवताना कोरलेली आहे.) भारतीय संगीतातील तालाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की त्याला ठराविक मात्रा असतात. यामध्ये पहिल्या मात्रेला 'सम' असे म्हणतात. आणि तालाच्या रचनेनुसार त्यातील एक मात्रा 'काल' अशी असते. परतपरत समेवर येण्याच्या कालांतराला 'लय' असे म्हणतात. या शिल्पांमध्ये तबलेवाल्याच्यासमोर त्यांच्याकडे तोंड करून बसलेली, हातात झांज घेतलेली एक स्त्री वादक आहे. प्रत्येक वेळेस तालवादक समेवर आल्यावर ती झांज वाजवते. हिच्या दोन झांजांच्या वाजण्यामधील कालावधीने तालाची आणि या नृत्याची लय प्रस्थापित होते नृत्याच्या बाबतीतील अगदी महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे त्याला गती असावी लागते. स्थिर शिल्पामध्ये गतिमानता दाखविण्यासाठी कलाकाराने यात आणखी एक युक्ती केलेली आहे. शंकराच्या केशसंभाराचा जटांना आवळून त्याचा टोप केलेला दाखवला जातो. इतर देवांप्रमाणे याच्या डोक्यावर टोपी किंवा मुकुट नसतो. या केशरचनेला 'जटा मुकुट' असे म्हणतात. या शिल्पामध्ये कलाकाराने अशी कल्पना केली की हे नृत्य अनंत काळ चालत राहिले आणि एका क्षणी शंकराचा जटामुकुट हा सैल झाला आणि त्यातील वेण्या निखळल्या. निखळलेल्या एका वेणीची बट सुटून ती शंकराच्या खांद्यावर रूळताना दिसते. ज्यांना नृत्याची जाणीव आहे, अशा लोकांना हे शिल्प पाहताना अशी बट निखळण्यासाठी नृत्याची हालचाल कशी असू शकते हे ज्ञात असते त्यामुळे स्थिर शिल्पातही असणारी गतिमानता त्यांना कळू शकते. अपेक्षा अशी आहे की जर दगडातील ही गतिमानता दर्शकाला समजू शकली तर संभवतः सभोवतालच्या चराचर सृष्टीमधील चैतन्याचा साक्षात्कारही त्याला कधीतरी होऊ शकेल या शिल्पातील पार्वती ही शिवाचे नृत्य पाहते आहे. नवऱ्याचा पराक्रम कौतुकाने पाहणारी स्त्री ही देखील कलाकाराची प्रतिभा आहे की काय असे वाटावे. परंतु ज्ञानदेवांनी मात्र या प्रसंगावर कोटी केलेली आहे.
      'वामांगीचा लास्यविलासु ! जो हा जगतूप आभासु !
      तो तांडव मिसें कळासू ! दाविसी तू !' (ज्ञा. अध्याय १७ ओवी ८)
   पार्वती जणू काही म्हणते की, , सृष्टीच्या निर्मितीची प्रसूती वेदना तर माझी, केवळ तांडवाच्या रूपाने हे (शिव) नृत्यातून दाखवतात आणि निर्मितीचे सारे उत्पत्ती आणि लयाचे हे अविरत चालणारे चक्र दाखविण्यासाठी त्याने तालवादकाचर्चा श्रेय बळकावतार।
हे केलेली आहे. सम म्हणजे निर्मिती (जन्म) आणि काल म्हणजे लय (मृत्यू) प्रत्येक आवर्तनार जन्म आणि एकदा मृत्यू अशी कल्पना करून संगीतामध्येही आपल्या पुनर्जन्माच्या प्रतिनिधित्व केलेले आहे. काळाचे चक्र अविरत फिरत असून त्यात पुनःपुन्हा घटना घडतात असे असले तरी आपल्या जीवनात एकदाच जन्म आणि मृत्यू येत असतो आपल्या दृष्टीने काळ हा चक्रका नसून एकमार्गी (unidirectional) असतो. कारण आपल्या दृष्टीने आपण काळात सतत पुढेच कसे असतो. हे दाखविण्यासाठी शंकराच्या डाव्या पायाखालील स्त्री वादकाच्या हातात तालाच्या प्रत्ये मात्रेवर वाजणारे एक वाद्य आहे. तिच्यासाठी सम आणि काल नाही तर तिचा ताल एकमार्गी शिवाचे वैश्विक नर्तन हे चक्राकार (cyclic) असून त्याची पार्थिव अनुभूती मात्र एकमार्गी (unidirectional) असते हे सांगण्यात कलाकार यशस्वी झाला आहे.
   तांडवाच्या शिल्पांच्या कल्पकतेसमोर जगातील कलाकार आणि विद्वान विनम्र होतात. रोडी (Rodin) या जगप्रसिद्ध फ्रेंच शिल्पीने तर हे शिल्प पाहिल्यावर असे म्हटले आहे की, यातील परिपूर्णता पाहून मला छिन्नी आणि हातोडी फेकून शिल्पकलेतून निवृत्त व्हावेसे वाटते. उत्पत्ती, स्थिती आणि लयीचे हे महान नृत्य ज्या रंगमंचावर चालते त्याला चिदंबरम् असे नाव दिलेले आहे.आनंद कुमारस्वामी हे जन्माने सिलोनी असले तरी भारतीय शिल्पशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. त्याने नटराजाचे हे नृत्य चालणाऱ्या रंगमंचाचे नाव चिदंबरम् का? यावर भाष्य केले आहे. ते असे म्हणतात की चिदंबरम् या शब्दावर श्लेष केलेला आहे. त्याचा दुसरा अर्थ मानवी अंतःकरणाचा केंद्रबिंदू असाही होतो. कुमारस्वामी पुढे म्हणतात, की या भारतीय कलाकारांची महती काय तर त्यांच्या शब्दात "While the artists of the world were trying to understand and imitate nature ancient Hindu artists were trying to understand nature's nature."

   नादंत तांडव :-

       कलेच्या कार्यक्रमात रंगमंचावर हे शिल्प नेहमी दिसते किंवा नाटक सुरू होण्यापूर्वी पडद्यामागे त्याचे पूजन केले जाते. धातुमुर्तीमध्ये गोलाकार वलयामध्ये एका पायावर उभ्या असलेल्या शंकराची नृत्य मुद्रा यात दिसते. वलयावर प्रत्येकी पाच ज्वाला असलेल्या अग्नीचे शिल्यांकन असते.चार हातांच्या ह्या मूर्तीतील वरच्या उजव्या हातात डमरू आणि वरच्या डाव्या हातात अग्री असून, उजवा हात अभय मुद्रेत असून खालचा डावा हात गजहस्त (हत्तीच्या साडेसारखा झुलणारा) उजव्या मनगटाखाली डाव्या हाताचे मनगट असते, डाव्या हाताच्या बोटाने त्याने उचललेल्या पायाकडे अंगुलीनिर्देश केलेला असतो. तोल सावरण्यासाठी किंचित गुडघ्यात वाकविलेल्या उजव्या पायाखाली एक व्यक्ती दिसते. हात पाय दुमडून बसलेल्या या व्यक्तीच्या पाठीवर शिवाचा उजवा पाय असतो. तांडवाचे एकूण एकशे आठ प्रकार आहेत. त्यातील या मुद्रेला नादंत तांडव असे म्हणतात. शंकराभोवताली असणारे हे ज्वालांचे वलय यातील प्रत्येक ज्वालेला पाच शिखा असतात. पंचमहाभूतांचे ते निर्देशक आहे. यांची संख्या सत्तावीस असून हे सत्तावीस नक्षत्रांमध्ये बद्ध असलेल्या आपल्या आकाशगंगेचे रूप असते. डमरू हे उत्पत्तीचे रूप. ब्रह्मांडामध्ये सर्वप्रथम महानाद झाला आणि मानवी बोधाचे शब्द प्रकरणे-
         अइउण्। ऋलृक् । एओङ्। ऐऔच्। हयवरट्। लण्। अमड. णनम्। झभ ञ। घढधष् । जबगड्रदश् । ख फ छठ थचटतव्। कपय्। श ष सर्। हल् ।
   या महानादाच्या पाठोपाठ झालेल्या स्फोटातून प्रचंड मोठा अग्नी निर्माण झाला. या ज्वाळा ब्रह्मांडाची मूलभूत ऊर्जा आहे. म्हणून शिवाच्या डाव्या हातात अग्ग्री दाखविलैला असतो. यातून नंतर पंचमहाभूतांची निर्मिती झाली. महाभूतांच्या मिश्रणातून सृष्टी उत्पन्न झाली.
चित्र क्र. ६८: नादंत तांडव, धातुमूर्ती

        काहीही निर्माण करण्यासाठी काही तरी वापरावे लागते, काही तरी तोडावे लागते, मोडावे लागते किंवा त्याचे आहे ते स्वरूप बदलावे लागते. आधी केलेले सर्व तोडून मग नवीन आणि पुन्हा हे सर्व मोडून त्यातून नवीनतम करायचे म्हटल्यास सगळेच क्षणाक्षणाला नष्ट करावे लागेल. मग सृष्टी राहणार कशी म्हणून शिवाचा उजवा हात अभय मुद्रेत असतो. जे इष्ट आहे, जे सुष्ट आहे त्याला त्वरित न तोडता तसेच राखण्याचे आश्वासन तो देतो. परंतु जे अनिष्ट आहे त्याचे रूपांतर म्हणजे लय आणि जे दुष्ट आहे त्याचा नाश म्हणजे संहार तो करतो. हे कार्य त्याचे अविरत सुरू असते म्हणून त्यांच्याभोवती फिरण अग्रिगोलकांचे वलय हेच सुचित करत असते. याला 'तिरोभाव' असे म्हणतात

चित्र क्र. ६९: नावंत तांडव, दशावतार लेखणे, वेरूळ

     शिवाचा पाय हे त्याच्या अनुग्रहाचे निर्देशक असते. जर त्याचे दोन्ही पाय टेकलेले दाखवले गेले असते कोणालाच मुक्ती देत नाही असा त्याचा अर्थ झाला असता. शिवाने एक पाय उचलल्यामुळे ध्यास घेतलेल्या मुमुक्षांना तो मुक्ती मार्गावरून जाऊ देतो. त्यासाठी त्याने (शिवाने) त्यांना (मुमु अनुमती दिली आहे हे त्याच्या डाव्या पावलाकडे निर्देश करणाऱ्या डाव्या हातांच्या बोटांवरुन केले जाते. ब्रह्मांडातील दुष्ट शक्तींचा, दुष्ट प्रवृत्तींचा आणि उपद्रवी घटकांचा कधीही समूळ नाश करता येत नाही. त्यांचे फक्त दमन करता येऊ शकते किंवा त्यांच्यावर तात्कालिक नियंत्रण ठेवता येते. त्याच्या पायाखालील व्यक्तीच्या रूपात या दुष्ट शक्तीचे प्रतिनिधित्व केलेले असते. याला 'अप पुरुष' असे म्हणतात. त्यामुळे तांडवाच्या शिल्पाचे उत्पत्ती (डमरू), स्थिती (अभय मुद्रा), (अग्नी), तिरोभाव (प्रभावळ) आणि अनुग्रह (उचललेला पाय) हे पाच गुणधर्म मानले आहे धातूशिल्पांमध्ये दिसणारे हे रूप पाषाणशिल्पांमध्ये मात्र क्वचितच दिसते. पाषाणशिल्पांमध्ये तांडवाची अन्य रूपे कोरलेली दिसतात याचे कारण धातूमूर्ती ओततानाची काही तांत्रिक बंधने येथे नसतात. तसेच पाषाण शिल्पांमध्ये उचललेला पाय पण दाखविताना त्याचा त्रिमितीचा आभास निर्माण करणे तसे अवघडच जाते.
       नादंत तांडवाचे एक विलोभनीय शिल्प वेरुळमधील दशावतार लेण्यामध्ये (वेरुळ क्रं. १५) कोरलेले आहे. या शिल्पात नृत्य मुद्रेत असलेला शिव हा आठ हातांचा असून त्याचा डावीकडचा एक आणि उजवीकडचा एक असे कोणत्याही दोन हातांचा विचार केल्यास त्यातून एक नृत्य मुद्रा प्रकटते.

वेरुळ मधल्या विविध तांडव मूर्ती

   ललित तांडव - हे लंकेश्वर लेण्यातील (लेणी क्र. १६) शिल्प असून अत्यंत गतिमान नृत्याचे शिल्पांकन आहे. जवळजवळ आठ फूट उंचीच्या या मूर्तीमध्ये कलाकाराने त्याची प्रतिभा पणाला लावलेली दिसते. गती दाखविण्यासाठी त्याचे हललेले केस, उडणारे वस्त्र याशिवाय त्याच्या डाव्या हातात डमरू दाखवलेला आहे. इतकी गती आहे की पाहणाऱ्याला डाव्या हाताच्या ठिकाणी उजवा हात असल्याचा भ्रम होतो.

चित्र क्र. ७० ललित तांडव, लंकेश्वर लेणे, र

    भुजंगत्रासित तांडव साप पाहिल्या नंतर दचकून पाय जसा उचलला जातो त्याप्रमाणे डावा पाय उचलून भुजंग त्रासित ही मुद्रा नृत्यात केली जाते. साधारणपणे रंगमंचीय प्रस्तुतीकरणात मांडी जमिनीला समांतर होईल या उंचीपर्यंत नर्तकाचा पाय उचललेला असतो, या शिल्पात मात्र शंकराची ही मुद्रा असल्यामुळे त्याचा गुडघा, हनुवटीपर्यंत उचललेला दिसतो. हे शिल्प कैलास मंदिरातील प्रदक्षिणा पथावर मुख्य मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर कोरले आहे.
चित्र क्र. ७९ : भुजंगत्रासित तांडव, कैलास मंदिर, वेरूळ

ऊर्ध्वजानू तांडव :-याची कथा अशी कालीचे नृत्य आणि शंकराचे तांडव याची स्पर्धा सुरू झाली. शिवाप्रमाणे कालीने सर्व तांडवांचे प्रकार लीलया करून दाखवले. शेवटी शंकराने नृत्य करताकरता एका पायावर नृत्य सुरू केले आणि उजव्या पायाचा अंगठा हातानी धरून आपल्या कपाळावर टेकवला. ही मुद्रा कालीलाही करणे शक्य होते परंतु स्त्रीसुलभ संकोचाने तिने ते तसे केले नाही. (शिवरामामूर्तीः १९७४१. ३७९). कैलास मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेरील डावीकडच्या भिंतीवर हे शिल्प आपल्याला दिसते यात शंकराचा उजवा पाय ताठ होऊन त्याच्या खांद्यावर गेल्याचे कोरलेले आहे.

चित्र क्र. ७२ : ऊर्ध्वजानु तांडव, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम

दक्षिणामूर्ती - शिवाच्या बसलेल्या मूर्तीमध्ये ध्यानस्थ शिव अशी मूर्ती आपल्याला दिसते. योगशास्त्राचा आचार्य म्हणून शिवाचे हे ध्यान दक्षिण भारतात प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. काहींच्या मते कला, संगीत व इतर भौतिक शास्त्रे यांचा उपदेश देत असताना शंकराचे तोंड दक्षिण दिशेकडे होते. श्रीमद शंकराचार्यांनी इतरांबरोबर दक्षिणामूर्तींचेही बरेंच स्तवन केले आहे. वेरुळमध्ये कैलास मंदिराखाली पश्चिम भिंतीवर याचे विराट शिल्प आहे. या शिल्पात झाडाखाली पद्मासना बसलेली, उजवा हात मांडी घातलेल्या उजव्या गुडघ्यावर असून डावा हात डाव्या मांडीच्या गुडघ्यावर जमिनी बोटे असलेल्या स्थितीत (भूमी मुद्रेमध्ये) आहे. एका आसन बसलेली ही शिवाची मूर्ती आहे. निर्माण करणाऱ्या त्या महायोगा समाधी लागली. आता नवनिर्मिती कशी होणार ह्या चिंतेतून अष्टदिश देव धावत आले. शिल्पाच्या वारच्या भागात आपापल्या वाहनांवर देव शिवाला हात जोडून विनंती करताना दिसतात. शिवाच्या खालच्या बाजूला दोन गण दाखवले आहेत. समाधी सोडण्याची त्यातील एक जण ढोल बडवतो आहे तर दुसरा त्याच्या वाद्याचा कर्कश आवाज काढून शिवाला जागे करावयाचा प्रयत्न करतो आहे. या गणांच्या वादनाने अन्य योग्यांची समाधी भंग पावली. शिवाच्या बाजूला गुडघ्याभोवती योगपट्ट गुंडाळलेले योगी दिसतात. भगवान शिव मात्र अविचलित आणि शांतच बसलेले दिसतात.

चित्र क्र. ७३ : महायोगी शिव, कैलास मंदिर, वेरूळ

लकुलीश - इ.स. पहिल्या शतकात लकुलीश नावाच्या एका आचायनि कायावरोहण (गुजरात) या तीर्थक्षेत्री पाशुपत पंथाची स्थापना केली. पुढे यालाच शिवाचे रूप म्हणून मान्यता प्राप्त झाली. कमळावर किंवा आसनावर बसलेली ही शिवाची मूर्ती असून त्याच्या हातात एका सोटा दाखवला जातो. याला लगुड असेही म्हणतात. ही मूर्ती नेहमी उर्ध्वलिंगी या स्वरूपातच कोरलेली  असे. वेरुळमध्ये घुमार लेणे (क्र.२९) येथे याचे मोठे शिल्प आहे. तसेच कैलास मंदिरामागील पश्चिम भिंतींवरील व्हरांड्यात याची उभी मूर्तीही दिसते.

चित्र क्र. ७४ : लकुलीश, धुमार लेणे, वेरू

उमामहेश्वर आलिंगन मूर्ती-

    उमामहेश्वर या शिल्पामध्ये नंदीवर आरूढ शंकर आणि पार्वती ज्यामध्ये दोघांचेही दोन्ही पाय नंदीच्या एकाच बाजूला (दर्शनी बाजूला) सोडलेले दिसतात. शंकराचा डावा हात पार्वतीच्या कमरेभोवती असून त्याने तिला एक हलके आलिंगन दिलेले असते. या शिल्पाला उमामहेश्वरालिंगन मूर्ती असे म्हणतात. कैलास मधील दक्षिणे-कडील व्हरांड्यात हे शिल्प आहे.

चित्र क्र. ७५: उमामहेश्वर, कैलास मंदिर, वेरूळ

अर्धनारीश्वर शिवाच्या शिल्पांमधील सर्वपरिचित आणि लोकप्रिय असलेले हे शिल्प. बहुतेक वेळा ही मूर्ती उभी असते. पण क्वचित प्रसंगी बसलेलीही आढळते. हरिहर मूर्ती प्रमाणेच हे एक जोड शिल्प आहे. यातील मूर्तीचा उजवीकडचा अर्धा भाग हे शंकराचे अंग आणि डावीकडील भाग हे पार्वतीचे अंग. यामध्ये डोक्यातील केश रचना सुद्धा वेगळी दिसते. तसेच चेहरा आणि अन्य शरीराचे भाग ह्यातील वेगळेपण दाखवायला अत्यंत कौशल्याने कोरलेले दिसतात. पार्वतीच्या डाव्या हातामध्ये आरसा दिसतो. स्वतःला पूर्णत्व आणण्यासाठी ती शिवाशी एकरूप होते. परंतु तोंड वळवून ते न पाहता असल्यामुळे आरशात बघून त्याची खात्री करून घेते. सांख्य तत्त्वज्ञानातील पुरुष आणि प्रकृती ऐक्य सांगणारे, वैश्विक तत्वज्ञानातील जड आणि चेतन किंवा वेदातील अद्वैत कल्पना साका शिल्प असून असून अणूची संरचना आणि कार्य याचे हे प्रतिक आहे. या एकरूपतेचे अत्यंत समर्पक निरूपण ज्ञानेश्वरांनी (ज्ञानेश्वरी, अध्याय ५ ओवी क्र. १३२ ते १३५) केले आहे.

चित्र क्र. ७६ : अर्धनारीश्वर, गंगैकॉडचोलपुरम, तमिळनाडू
कल्याणसुंदर - -
      कल्याण म्हणजे लग्न. शंकर पार्वतीच्या लग्नाचे अत्यंत मनोहारी शिल्पांकन अनेक मंदिरात दिसते. या शिल्पामध्ये साधारणतः शंकराने पार्वतीय पाणिग्रहण केलेले दाखवते त्यामध्ये खाली होम पेटलेला असतो आणि ब्रह्मदेव पौरोहित्य करताना दिसतो. याशिवाय पार्वतीच्यामागे तिचे वडील हिमवान, तिची आई मेना आणि शिवाचे गण, दासदासी वगैरे ही दाखवलेले असतात. दशावतार लेणीतील (वेरुळ लेणी क्र. १५) एका शिल्पात पार्वतीने आपले दोनही शंकराच्या हातात दिलेले दिसतात. कैलास मंदिरातील पूर्व भिंतीवर मात्र या मालिकेतील सर्वात सुंदर शिल्प कोरलेले आहे. या शिल्पामध्ये पार्वतीने आपल्या उजव्या हाताने शंकराचा हात पकडलेला असे अजब शिल्पांकन आहे. ही कलाकाराची चूक नसून त्याची असामान्य प्रतिभा इथे प्रगटलेली दिसते. या शिल्पात वधू पार्वती लज्जेने मान झुकविलेली (अधोवदना) व नजर खाली वळविलेली (सलज्जा) आणि डावा पाय किंचित वाकवून (सविनया) अशी उभी आहे. पण गंमत पहा तिने शंकराचा हात हाती घेतला आहे. कलाकाराची चूक तर नव्हे ? नाही, अहो हेच व्हावे म्हणून पार्वतीनेच तर तप केले होते. हे जमविण्यातला तिने घेतलेला पुढाकार यात दर्शविलेला आहे. पण हे धारिष्ट्य सर्वांसमोर करावे लागले त्यामुळे ती संकोचली आहे. ज्यामुळे तिच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने उजव्या पायाचा अंगठा घासते आहे. निर्जीव पाषाणात साकार केलेला हा जिवंत देखावा खरोखरच पाहण्यासारखा आहे. शंकराचाही उजवा गुडघा किंचित वाकलेला आहे. साहजिकच आहे. मी मी म्हणणाऱ्या नवरदेवांप्रमाणे साक्षात महादेवाचीही बोहल्यावर चढल्यावर अशीच गत झाली असेल नाही का?

चित्र क्र. ७७ : शिवपार्वती विवाह, कैलास मंदिर, वेरूळ

सारिपाट क्रीडा :-
   शिव पार्वती यांचा विवाहानंतर संसार सुरू झाला, स्वाभाविकच पती- पत्नींच्या मनोरंजनाचेही कार्यक्रम सुरू झाले. शंकर पार्वती सारिपाट खेळावयास बसले. नवविवाहितांच्या मानसिकतेप्रमाणे सुरुवातीचे डाव शंकर मुद्दाम हरत राहिले. एकेक गोष्ट पणाला लावत पार्वतीच्या आग्रहाने त्यांनी त्यांच्या प्रिय नंदीलाही पणास लावले आणि हरले. नंदीला घेऊन जायला पार्वतीची दासी गेली आणि तिने त्याला कानाने ओढून नेत असल्याचे कलाकाराने दाखविले आहे. बलाढ्य नंदी आता दास झाला आहे हे कळल्यावर शिवाच्या काही गणांनी त्याला त्रास द्यावयाला सुरुवात केली. कोणी शेपूट चावत आहे तर कोणी शिंग धरत आहे, तर तो जाऊ नये म्हणून कोणी त्याचे पाय धरत आहे. अन्य गण नंदीच्या दहशतीतून मुक्त झाल्यामुळे त्यांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. कोणी दुसऱ्याचे केस उपटतो आहे तर कोणी मुष्टिप्रहार करतो आहे, कोणी आपला पृष्ठभाग उघडा करून दाखवितो आहे, तर कोणी चक्क वाकुल्या दाखवितो आहे, वर्गातून शिक्षक बाहेर गेल्यानंतर बालवाडीमध्ये आपणही हेच करत नव्हतो का ?
 चित्र क्र. ७८ : सारीपाट खेळ, रामेश्वर लेणे, वेरूळ

शिल्पामध्ये वरील भागात खेळाला वेगळीच कलाटणी मिळालेली कलाकाराने दाखवली आहे. हातात फासे घेऊन अजून एक शेवटचा डाव खेळायचा आग्रह शिवाने केला. पार्वतीच्या लक्षात आले की हा अंतर्यामी महादेव आतापावेतो हरलेले सर्व काही परत मिळविणार, म्हणून तिने डाव सोडून जायची तयारी केली. तिच्या उठण्याच्या हेतूचे शिल्पांकन कलाकाराने तिच्या डाव्या हाताखालील उशी दबली गेली असल्याचे दाखवून केले आहे. तसेच तिचे डावे ढोपरही सरळ आहे. तिचा उजवा हात विस्मय मुद्रेमध्ये आहे. जणू काही ती शिवाला विचारते आहे, "काय देवा, हे तुम्हाला शोभते का ? काय काय डावावर लावायचं आणि कोणचे दान पडणार हेही तुम्हीच ठरविणारे, माझी काय फजिती करण्यासाठी हा आग्रह सुरू आहे का? " भगवान शंकराची मुद्रा मात्र अत्यंत बोलकी आहे. ते म्हणत आहेत की कोण जिंकलं किंवा कोण हरलं याच्यासाठी खेळ खेळला जात नाही.खेळ तर केवळ खेळासाठी असतो. एवढ्याशा कारणाने खेळ कधीही अर्धवट सोडता कामा नये कारण हा केवळ सारिपाट नव्हे तर संसाराचाच खेळ असतो.
  सोमास्कंद मूर्ती :-
    (स उमा स्कंद) पार्वती आणि स्कंद - कार्तिकेय यांच्यासह असणारे हे शिल्प असते. या शिल्पामध्ये शंकर आणि पार्वती यांच्या बरोबरच छोटासा (बाल) स्कंदही असतो. तो उभा, नाचताना किंवा आईच्या मांडीवरही असू शकतो. शिव पार्वती अर्थातच बसलेले असतात. वेरुळमध्ये हे शिल्प कैलास मंदिराच्या गर्भगृहाबाहेरील उजवीकडच्या भिंतीवर आहे. यातील पार्वतीचे डोके मात्र आता नाही. शिवाच्या मांडीवर बाल स्कंद असून तो आपल्या आईकडे बघतो आहे, परंतु त्याचा उजवा हात उचललेला असून त्याची मूठ वळलेली आहे. तो आपल्या छोट्या तर्जनीने शिवाकडे बोट दाखवून आपले बाबा हे किती मोठे आहेत हे अभिमानाने सांगतो आहे.
चित्र क्र. ७९ : सोमास्कंद, महाबलीपुरम, तमिळनाडू

असेच शिल्प महाबलिपुरमच्या समुद्र किनाऱ्याजवळील मंदिरातही आहे. तेथे कार्तिकेयाच उजवा हात अशाच प्रकारे शंकराकडे बोट करताना दिसतो, तर त्याचा डावा हात त्याने स्वतःच छातीवर ठेवला आहे. माझे बाबा आहेत असे तो आग्रहाने दाखवतो आहे.

गंगाधर मूर्ती :-
      भगीरथाने दीर्घ प्रयत्न करून आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता स्वर्गातून गंगेला आणण्याच उपक्रम केला, वेरुळ येथील कैलास मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला गंगावतरणाचे विलक्षण शिल्प कोरले आहे. डाव्या कोपऱ्यातील तप करणाऱ्या भगीरथाच्या तपश्चर्येने गंगेचे अवतरण झाले आहे. ती शिवशंकराच्या खांद्यावर आरूढ आहे, श्रीशंकराने आपली एक बट मोकळी करून गंगेला प्रवाही केले आहे. जन्हु राजाने तिला अडवली. शिल्पामध्ये डावीकडे जन्हु राजा बसलेला दिसतो. त्याची समजूत काढल्यावर त्याने तिला न गिळता आपल्या कानातून वाट काढून दिली. त्याला कानातून ती पुन्हा वाहू लागली. शिल्पाच्या खालच्या बाजूला मुक्तीची वाट पाहत बसलेले सगरपुत्र दिसतात. गंगेच्या पावन स्पशनि त्यांना मुक्ती मिळाली. कलाकाराची कल्पकता मात्र या शिल्पात कोरलेल्या पार्वतीमुळे उठून दिसते. तिला वाटले की तिच्या नवऱ्याने सवत आणली म्हणून ती चिडते, रुसते. शंकराच्या हे लक्षात आल्यावर त्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तर ती त्याचा हात झिडकारताना दाखवली आहे. तरीही तो तिची हनुवटी उचलून तिला जणू काही हे सांगतो की, अगं वेडाबाई ही सवत नाही, तिच्यावर उगीच रागावू नकोस. भरतभूमीवर घडणाऱ्या या अभूतपूर्व सोहळ्याला डोळे भरून पाहा, केवळ सगरपुत्रांनाच नव्हे तर कोट्यवधी मानवांना शतकानुशतके मुक्ती देण्याकरता, भारताला सुजलाम् सुफलाम् करण्याकरता ही पावन गंगा आज पृथ्वीवर अवतरते आहे तिचे स्वागत कर. पार्वती मात्र संतापाने काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शिवाचा हात ती त्वेषाने झिडकारते आहे. कोण्या मूखनि तिच्या तोंडावरच घणाचा घाव घातल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरील क्रोधित मुद्रा मात्र आज दिसू शकत नाही.

चित्र क्र. ८० : गंगावतरण, कैलास मंदिर, वेरूळ

अनुग्रह मूर्ती :-
 शिवाच्या अनुग्रह मूर्तीमध्ये रावणानुग्रह, चंडेशानुग्रह, विष्णवानुग्रह असे विविध प्रकार आढळतात. यातील रावणानुग्रह मूर्ती हे अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. वेरुळ मध्ये रामेश्वर लेणे (क्र.२१), रावण की खाई (क्र. १४), दशावतार लेणे (क्र.१५) कैलास आणि लंकेश्वर (क्र.१६) आणि धुमार लेणे (क्र.२९) इथे हे शिल्प पाहावयास मिळते. याशिवाय घारापुरी, विरूपाक्ष मंदिर (पट्टदकल), परशुरामेश्वर मंदीर (ओडिशा), बृहिदश्वर मंदिर (तंजावर), आँढा नागनाथ या ठिकाणी हे शिल्प दिसते. एवढेच नाही तर कंबोडियातील मंदिरांमधेही याचे अत्यंत कल्पक शिल्पांकन आढळते. याशिवाय गंगाई कोंडचोलापुरम् (तामिळनाडू) येथे चंडेशानुग्रह यांचे सुंदर शिल्प आहे. कैलास मंदिराच्या दक्षिण भिंतीवर कोरलेले शिल्प हे या सर्वांमधील सर्वात भव्य आणि सर्वात श्रेष्ठ शिल्प आहे.

चंडेशानुग्रह :-

   तमिळनाडूमधील ६३ नायनमार किंवा नयनार या शैव संतांची माहिती असणारे पेरीय पुराण १२व्या शतकात लिहिले गेले. यामध्ये चंडेश्वराची कथा येते. विचार सर्मण हे त्याचे मूळ नाव. या गावातील लोक गायींना नीट वागवत नाहीत हे पाहून त्याने स्वतः गायींची काळजी घ्यायचे ठरविले. यावर प्रसन्न होऊन गायी त्याला भरपूर दूध देत. हे सर्व दूध तो शिवाच्या वाळूच्या केलेल्या शिवलिंगावर रोज वाहून टाकायचा. हे त्याच्या वडीलांना कळले. त्यांनी रानात जाऊन पाहिले तर हा शिवपूजेत मग्न होऊन वाळूच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करत होता. क्रोधाने त्यांनी त्याला काठीने मारायला सुरुवात केली. आपल्या भक्तीत व्यत्यय आणणाऱ्याकडे न पाहताच विचार सर्मणाने ती काठी हिसकावली आणि मारणाऱ्याच्या माध्य आपल्याच वडीलांच्या दिशेने भिरकावली. शिवकृपेने त्या काठीची कुऱ्हाड झाली आणि ती त त्याच्या वडीलांचा मृत्यू झाला. तरीही हा पूजेतच मग्न होता. त्याची ही निस्सिम भक्ती पाहून शिव झाले आणि पार्वतीसह ते प्रकट झाले. त्यांनी आपल्या भक्ताला आलिंगन दिले. त्यामुळे सर्मण सारुप्य मुक्ती मिळाली. शिव त्याला म्हणाले की, 'आता मीच तुझा पिता. तू चंडिकेश्वराच्या धामीड तिथे तुला माझ्याप्रमाणेच पूजतील'. यानंतर आपल्या गळ्यातील माळ स्वहस्ते चंडेशाच्या डोक्या फेट्यासारखी बांधली. आणि शिवपार्वती अंतर्धान पावले. विचार सर्मण चंडेश झाला. अशा निम्तो शिवभक्ताच्या हाताने मृत्यू आल्यामुळे त्याच्या वडीलांनाही मुक्ती मिळली आणि पितृहत्येचे चंडेशला लागले नाही. (शिवानंद : १९९९, पृ. २८). गंगाईकोंडचोलापुरम येथील मंदिरात या प्रमाण उत्कृष्ट शिल्पांकन केलेले आहे.

चित्र क्र. ८१ : चंडेशानुग्रह, गंगैकोंडचोलपुरम, तमिळना
विष्णवानुग्रह :-
   विष्णूने शिवाकडून सुदर्शन चक्र प्राप्त करण्यासाठी उग्र तपश्चर्या केली. त्याने फूले अर्पण करण्याचा संकल्प केला. ती फुले घेऊन तो शिवाला अर्पण करायला गेला तेव्हा एक फूल शिवाने लपवून ठेवले. प्रत्यक्ष फुले वाहताना एक फूल कमी असल्याचे जेव्हा विष्णुच्या
 लक्षात आले तेव्हा त्याने त्या एका फुलाऐवजी आपला एक डोळाच काढून शंकराला अर्पण करून संकल्प पूर्ण केला. कमळ कमी पडले म्हणून कमल-नयन दिले! त्याची ही भक्ती पाहून प्रसन्न होऊन शिवाने त्याला सुदर्शन चक्र दिले (शिवपुराण, अ. ३१, ४०-५२). याचे एक शिल्प कांचीपुरम् येथील कैलासनाथच्या मंदिरात दिसते. यामध्ये आसनावर शिव-पार्वती बसलेले असून शिवाच्या उजवीकडे खाली विष्णू बसलेला असून तो आपला एक डोळा काढून शिवाला अर्पण करताना दाखवलेला आहे.

किरात- अर्जुनानुग्रहमूर्ती :-

    पांडवांच्या वनवासात धर्मराजाने अर्जुनाला इंद्राकडून दिव्यशक्ती प्राप्त करून घ्यायला सांगितले. अर्जुन इंद्राला भेटला तेव्हा इंद्राने त्याला सर्व सामर्थ्यशाली शिवाकडून पाशुपतास्त्र घेण्यास सांगितले. अर्जुन हिमालयात गेला आणि त्याने घोर तपश्चर्या आरंभ केली. ती पाहून हिमालयातील ऋषींनी शंकरांना सांगितले की तो एवढी तपश्चर्या करतो आहे, तर त्याची इच्छा पूर्ण करावी. शंकराने अर्जुनाची परीक्षा घ्यायची ठरवले. किरात वेष धारण करून शंकर अर्जुनाच्या जवळ पोचला. तेव्हा त्याला दिसले की, मूक नावाचा एक राक्षस वराहचे रूप घेऊन अर्जुनावर हल्ला करायच्या

चित्र क्र. ८२ : अर्जुनानुग्रह, महाबलीपुरम, तमिळनाडू

तयारीत आहे. म्हणून त्याने आपले धनुष्य काढले. तोपर्यंत अर्जुनानेही आपले धनुष्य सज्ज केले. शंकर म्हणाला की मी त्या वराहला आधी पाहिले म्हणून मी त्याला मारणार. अर्जुनाने किराताच्या बोलण्याचा अनादर करून वराहावर बाण सोडला. तिकडून शंकरानेही एक बाण सोडला. दोघांच्या बाणाने वराहरूपी मूकराक्षस याने आपले भयंकर रूप प्रकट केले आणि मरून पडला. वराहला कोणी मारले यावरून या दोघात वाद सुरू झाला. दोघांनीही एकमेकांवर बाणांचा वर्षाव केला. आपल्या बाणांनी किरातला काही होत नाही हे पाहून अर्जुन त्याच्या अंगावर धावून गेला. मग त्यांच्यात द्वंद्वयुद्ध झाले, मग मुष्ठीयुद्ध झाले.अर्जुनाचा पराक्रम पाहून शंकर प्रसन्न झाला आणि त्याने आपले खरे रूप प्रकट केले व त्याला पाशुपतास्त्र दिले. (महाभारत, आरण्यपर्व, किरातपर्व, अ. ३८-४०),
     वेरुळमधल्या  महाभारताच्या शिल्पपटाची सुरुवातच या कथेने होते. त्यात सुरुवातीला वराहाभोवती दोन धनुर्धर दाखवले आहेत. नंतर त्यांच्यामध्ये झालेले मुष्टी युद्ध आणि द्वंद्र आणि त्यापुढे आसनस्थ शिव त्यांच्या पुढे गुडघे टेकून शंकराच्या पाया पडणारा अर्जुन दिसतो. महाबलिपुरम येथे अर्जुनाच्य तपश्चर्येचे हे शिल्प पंधरा फूट उंच आणि चाळीस फूट रुंद अशा विराट कातळावर कोरलेले आहे. शिल्पात दोन्ही हात डोक्यावर धरून डाव्या पायावर उभे राहून उजव्या पायाचा तळवा डाव्या गुढगा टेकून उभ्या असलेल्या तप करणाऱ्या अर्जुनाचे शिल्प असून त्याच्या शेजारी चार हातांचा त्रिशुलधारी शिव उभा असल्याचे शिल्प आहे. अर्जुनाने केवळ वायू भक्षण करून हात वर करून स्थिर स्थितीत तप केले म्हणून या शिल्पात वृक्षासनामध्ये उभा असलेला अर्जुन दिसतो. या कातळावर असंख्य शिल्प असून अर्जुनानुग्रहाचा हा सर्वात मोठा शिल्पपट आहे.

रावणानुग्रह क्र. १ :-

   रावणानुग्रहाच्या दोन प्रकारच्या मूर्ती दिसतात १) यामध्ये आपली दहा डोकी कापून शंकराल अर्पण करणाऱ्या रावणाचे एक शिल्प असते. याशिवाय २) शिव पार्वती ज्यावर विराजमान आहेत तर कैलास पर्वताला रावण उखडून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे शिल्प असते.
    वेरुळमधील कैलास मंदिराभोवतालच्या उत्तरेकडील व्हरांड्यातील पहिले शिल्प रावणानुग्रहाचे आहे. एका पिंडीभोवती ९ मानवी शिरे कोरलेली दिसतात. रावणाने श्रीशंकराला अर्पण केलेली स्वतःची ९ मस्तके (नवविधा भक्तीची प्रतीके) आहेत. दहावे मस्तकही तो कापत असल्याचे थरारक दृश्य आहे. याची कथा अशी की रावण रोज सकाळी तलावातून कमळ तोडायचा. स्नान करून शंकराची पूजा करायचा. एकदा शंकराच्या मनात विचार आला की रावणाची भक्ती आपण तपासून पाहावी. शंकराने त्याच्या ताटातील फुले काढून घेतली. स्नान करून रावण आला. पाहतो तर काय ? तेथे   कमळे नाहीत. आता फुले आणायला माघारी वळला तर संकल्प मोडतो आणि तसाच पूजेला देवळात देला तर देवाच्या पूजेसाठी रिकाम्या हाताने जावे लागणार. रावण काय ते समजला. क्षणाचाही विचार न करता तो तलवार घेऊन तरातरा तसाच पिंडीसमोर गेला आणि म्हणाला, देवा, परीक्षाच घ्यायची होती तर इतकी साधी कशाला ? दहा शिरकमले जी तू मला दिली आहेस, त्याचा उपयोग कधी होणार? असे म्हणून त्याने एका मागून एक आपली डोकी कापायला सुरुवात केली आणि पिंडीला तो अर्पू लागला. दहावे डोकेही कापण्याच्या तो तयारीत होता. शिल्पामध्ये एका हाताने कपाळ घट्ट धरलेले दिसते ते त्राग्याने नव्हे तर कापण्यासाठी, ते घट्ट धरून त्याचा निश्चय व्यक्त करण्यासाठी. समर्पित भक्तीची ही परिसीमाच नव्हे काय? ही भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला अनुग्रह दिला. देऊळ पाहायला सुरुवात केल्यावर विथिकेमध्ये अगदी प्रथमच हे शिल्प हेतूपुरस्सर कोरले आहे. इतकी अविचल निष्ठा आणि भक्ती आपल्या मनात असेल तर पायऱ्या चढून गेल्यावर त्या परब्रह्माचे दर्शन होऊ शकते, हा संकेत येणाऱ्या सर्व भक्तांसाठी सूचकतेने दिलेला आहे. कोणतेही मोठे काम करायचे असल्यास प्रसंगी शीर कापून द्यायची सुद्धा तयारी असेल तरच ते काम पूर्णत्वाला जाण्याची शक्यता असते असा संदेश या शिल्पातून देण्याचा प्रयत्न दिसतो. (देगलूरकर : २००८, पृ.५१)

चित्र क्र. ८३ : रावणानुग्रहमूर्ती, कैलास मंदिर, वेरुळ

रावणानुग्रह क्र. २ :-

      या प्रकारच्या शिल्पाला कैलास तोलन असे म्हणतात. महाराष्ट्र, कर्नाटक, ओरिसा आणि तमिळनाडू या ठिकाणच्या मंदिरातील हे अत्यंत लोकप्रिय शिल्प आहे. ह्याच्या तीन कथा-आशय तोच ठेवून - तपशिलात थोड्याफार फरकाने आढळतात. रामायणामधील कथेमध्ये कुबेराचा पराजय केल्यानंतर रावणाने त्याचा आकाशमार्गे जाणारा पुष्पक रथ घेतला आणि तो त्यातून विहार करू लागला. त्याचा रथ कैलास पर्वतापाशी अडला. ते पाहून शंकराचे गण आणि नंदी जे त्या वेळेस मर्कटरूपात होते ते त्याला हसू लागले. तेव्हा चिडून जाऊन रावणाने रागाच्या भरात कैलास पर्वत उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.

चित्र क्र. ८४ : कैलासतोलन, कैलास मंदिर, वेरूळ
  दुसन्या एका कथेमध्ये रावणाने शंकराला लकेत चलण्याचे आवाहन केले. तेव्हा आपण सोडून जाऊ शकत नसल्याचे शिवाने त्याला सांगितले. त्यावर उपाय म्हणून रावणाने कैलासासह शिवपार्वतीला लकेत न्यायचे ठरविले. म्हणून कैलास पर्वत उचकटण्याचा प्रयत्न त्याने केला.शंकराने कैलास हलल्यास ब्रह्मांडाचे संतुलन बिघडेल म्हणून आपल्या उजव्या पायाचा अंगठा दाबून स्थिर केले. तसेच रावणाचेही दमन केले. रावणाची ही भक्ती पाहून शिवाने त्याला चंद्रहास तलवार दिली. या कथेवर आधारित शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी कोरलेले दिसते.
   तर तिसऱ्या कथेमध्ये शंकर पार्वती यांच्यामध्ये काही कारणाने विसंवाद निर्माण झाला त्यामुळे शिवाच्या द्वारपालाने रावणाला कैलासावर जाण्यापासून अडवले. या कथेवर आधारित संबध भारतातील हे एकमेव शिल्प असावे. (अपवाद लंकेश्वर लेण्यामध्ये याचा एक प्रयत्न झालेला दिसतो. )
    वेरुळ येथील कैलास मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सर्वात विलक्षण, कल्पक, परिपूर्ण तोलनाचे शिल्प आहे. त्याची कथा अशी, रावण कुबेराचा पराभव करून आकाशमार्गे परतताना चाटेवर कैलास पर्वत दिसला. तो पाहण्याच्या इच्छेने तो पर्वतावर उतरला. उतरताक्षणी श्रीशंकराच द्वारपालांनी त्याला रोखले. उन्मत रावणाचा अहंकार जागृत झाला व मस्तीने तो म्हणाला, 'ज्या ठिकाणी मला मुक्त प्रवेश नाही, ती जागाच लंकेत घेऊन जातो. मग बघतो मला शंकराचे दर्शन घेण्यापासून कोण प्रतिबंध करतो ते." रागाच्या भरात तीरासारखा तो कैलास पर्वताच्या खाली गेला, वीरासनावर बसून आपल्या वीसही हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवून उखडून काढला. कैलासाला भूकंपासारखे हादरे बसू लागले. त्या वेळी कैलासावर काय स्थिती होती बरे? शिव पार्वती असले तरी ते शेवटी नवराबायको. काही भांडण झाल्याने पार्वती तोंड फिरवून कृतक्‌कोपाने महादेवापासून दूर बसली होती. दासी तिची समजूत घालत होती. अचानक बसणाऱ्या हादऱ्यांनी दासी भयकंपित होत स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळू लागली व पार्वती राग विसरून भयभीत होऊन शंकराला बिलगते. शिल्पकाराने खोदलेल्या बारकाव्यांमुळे हे शिल्प जिवंत झाल्यासारखे वाटते. पळणाऱ्या दासीला अंशात कोरलेले आहे, तिचा अंबाडा अर्धवट सुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तिचा वेग नजरेला जाणवतो. या गतीने पळताना समोर पाहून पळणे स्वाभाविक असते. पण या दासीचा नेत्रकटाक्षा मागे आहे, नवरा बायकोचे भांडण आता तरी मिटले की नाही हे पाहण्याच्या स्त्रीसुलभ उत्सुकने ! पार्वतीने भयकंपित होऊन शिवाचा दंड धरला आहे. तो तिने प्रेमाने घरलेला नसून भीतीने पकडला असल्यामुळे तिची बोटे विलग झाली आहेत. अत्यंत रेखीवपणे कोरलेले हे शिल्प तो क्षण आजही जणू जिवंत करते, कैलासाला बसलेल्या हादऱ्यांनी आजूबाजूच्या निसर्गावर आणि मनुष्यमात्रांवर झालेला परिणाम तितक्याच उठावदारपणे कोरलेला आहे. झाडावरची माकडे भयभीत झालेली आहेत.शिवगण रावणावर दगडांचा वर्षाव करत आहेत तर वादन करणारे कलाकार आपली वाद्ये खांद्यावर  पळायच्या तयारीत आहेत, हिमालयात तप करणारे ऋषी महादेवाकडे अपेक्षेने पाहत आहेत, देवा देवा आता कसे होणार ? पण हा सर्व कोलाहल श्रीशंकर शांतपणे न्याहाळत आहे. जणू त्याला विचारायचे आहे, अरे मी असताना तुम्हा सर्वांना इतके धाबरण्याचे कारण काय? तेही या यत्किचित रावणाला ? शिवाने आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने किंचित दाब द्यायला सुरुवात केली. या किंचित दाबानेही रावणाच्या अंगावर प्रचंड दबाव येऊ लागला. त्याचा एकेक हात श्रमाने थकून खाली पडू लागला, एक चेहरा रडू लागला, एक चेहरा मर्कटासारखा वेडावाकडा झाला. त्याच्या लक्षात आले की कैलास उपटणे सोपे पण तो हलवणे अशक्य कारण ही झुंज तर प्रत्यक्ष महादेवाशी आहे. येथे आपली डाळ शिजणार नाही. अशा प्रसंगी शिवाची स्तुती केली तरच आपली सुटका होईल हे रावणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या बुद्धिचातुर्याने एक स्तोत्र रचले. याला रावणविरचित शिवतांडवस्तोत्र असे म्हणतात. ते त्याने मोठमोठ्याने म्हणायला सुरुवात केली.
            "जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब्य लब्मितां भुजंगतुंगमालिकाम् ।
              डमड्डमड्डमड्मन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् ।।"
अशा प्रकारच्या पंधरा श्लोकांचे हे स्तोत्र ऐकून प्रसन्न झालेल्या भोळ्या शंकराने त्याला क्षमा केली. अचाट शक्तिशाली माणसाचा अहंकार नाहीसा करण्यासाठी परमेश्वराच्या यत्किंचित अंगठा टेकवण्याएवढी शक्ती पुरेशी असते. या शिल्पातून बोध घ्यायचा आहे तो असा की जीवनात भूकंपासारखे प्रसंग येतात. प्रत्यक्ष भूमी हादरून किंवा कुटुंबात भूकंपसदृश घटना घडल्यानेसुद्धा अशा प्रसंगी प्रज्ञावान मंडळींनी ठामपणे उभे राहून धैर्याने त्याचा सामना केला पाहिजे. हीच गोष्ट भगवंताने गीतेत सांगितली आहे.
          दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
          वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ।। भ. गीता २-५६ ।।
     एका श्रेष्ठ तत्त्वज्ञानाला एका पुराणकथेच्या माध्यमातून अत्यंत नाट्यमय पद्धतीनी शिल्पांकित करून आजरामर करण्याचा हा एक असामान्य प्रयोग म्हणावा लागेल. कैलासतोलन या मालिकेतील जगातील सर्वात मोठे आणि सर्वात श्रेष्ठ असे हे शिल्प आहे.

मार्कडेयानुग्रह :-

  मर्कड ऋर्षीना अनेक अपत्ये झाली. पण ती जगली नाहीत. ऋषींनी मग मृत्यूलाच साकडे घातले. यम प्रसन्न झाला आणि म्हणाला, मी तुम्हाला पुत्र देईन परंतु तो एक तर दीर्घजीवी आणि मतिमंद असेल किंवा अत्यंत हुशार परंतु अल्पजीवी असेल. मातापित्यांनी अल्पजीवी पण हुशार मुलगा होऊ दे असा वर मागितला. मुलगा झाल्यावर त्याचे नाव त्यांनी माकैडेय ठेवले. ही मार्कंडेय जन्माची कथा आहे. हा मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसा तो हुशार असल्यामुळे शिवाची भक्ती करू लागला. तो सोळा वर्षाचा झाला तेव्हा यम त्याला न्यायला आला. मार्कंडेय शिवाच्या आराधनेत इतका गुंग झाला होता की त्याच्याभोवती यमाने पाश टाकला आहे याचेसुद्धा त्याला भान राहिले नाही. शिवाने पाहिले की, एक अनन्यसाधारण भक्त आपली इतकी मनोभावे आराधना करता असताना त्याच्यावर मृत्यूसुद्धा काय म्हणून झडप घालेल ? पिंडीतून शिव प्रकटला आणि त्याने यमावरतीच हल्ला केला. त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसला आणि कमरेत लाथ मारली. ती लाथ इतकी जबरदस्त आहे की, यम अक्षरशः भेलकांडत गेल्याचे कलाकाराने कोरले आहे. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आहे की, आपल्याला मारणारा हा कोण? शैव पंथांचे उदात्तीकरण करणारी ही कथा आहे. वेरुळमधील कैलास लेणे क्र.१६ तर दशावतार लेणे (क्र. १५) येथे कोरलेले हे कालारी या नावाने सुध्दा ओळखले जाणारे शिवाचे संहारशिल्प सर्वोत्तम म्हणावे लागेल. याशिवाय विघ्नेश्वरानुग्रह व नंदिशानु अशी अनुग्रह शिल्पेही असतात.

चित्र क्र. ८५ : मार्कंडेयानुग्रह, कैलास मंदिर, वेरूळ

संहार मूर्ती :-
 शिवाच्या तांडवाचे वर्णन करताना शिव त्याचा तिसरा डोळा उघडतो आणि तो सर्वांचा सा कमलो असे सांगितले जाते. यावरून आकांडतांडव करणे हा वाक्यचारही रूढ झाला आहे.परंतु शिल्पकलेत मात्र असे संहार तांडव दिसत नाही. उलट पक्षी निर्मितीचा परमानंद चेहऱ्यावर प्रकटलेले त्याचे प्रसन्न आणि शांत रूपच दिसते. शिवाचे आक्रमक रूप त्याच्या संहार शिल्पांमध्ये दिसते. निरनिराळ्या असुरांचा वध दर्शवणारी ही शिल्पे असतात, ज्यामध्ये भैरव, गजासुरवध, अंधकासुर, त्रिपुरांतक, कालारी, कामंतक, शरभ, ब्राह्म शिरच्छेदक, वीरभद्र आदी शिल्पांचा समावेश असतो.

भैरव मूर्ती :-

 शिव पुराणामध्ये भैरव हे शिवाचे पूर्ण रूप. भैरव किंवा कालभैरव हा वाराणसीचा अधिपती मानला जातो. तसेच अनेक गावांचा रक्षक किंवा क्षेत्रपाल अशा देवाला भैरव असेही म्हणतात. या शिवाच्या रूपात त्याच्या जटा मुक्त झालेल्या असतात. भैरवाच्या गळ्यामध्ये नररूंडाची माळ असते. याशिवाय त्याच्या हातात खड्ग, त्रिशूल, डमरू आणि मुंड इ. असतात. कानात सर्प कुंडले, कमरेत घंटा असलेला करगोटा आणि घुंगरू असलेले नुपूर असतात. चेहऱ्यावर अत्यंत उग्र असे भाव असतात. काही मूर्तीमध्ये तो विवस्त्र असतो. भैरवाचे एक अत्यंत सुरेख शिल्प हे राणी की वाव-पाटण येथे आहे. या मूर्तीला अठरा हात असून हातांची जणू एक महिरपच त्याच्या भोवती झालेली दिसते. चेहऱ्यावर उग्र भाव दाखविण्यासाठी केवळ त्याचे डोळे वटारलेले आहेत. परंतु त्याची परिणामकारकता दाखविण्यासाठी कलाकाराने चांगलीच कल्पकता दाखवलेली आहे. शंकराच्या पायाखाली एक राक्षस कोरला असून त्याचा एक हात त्याने कापून टाकला आणि मुंडके उडवले असे दाखवले आहे. तोडलेले मुंडके शंकराच्या खालच्या डाव्या हातात केसाने धरलेले असून त्याच्या खाली एक श्वान आहे जो त्याच्या मानेतून टपकणाऱ्या रक्ताचे थेंब चाटताना दाखवले आहे. शंकराच्या उजव्या पायाजवळ त्याचा एक अस्थिपंजर परंतु जटाधारी गण आहे जो त्या दैत्याचा तुटलेला हात चावून खायचा प्रयत्न करतो आहे. (बीभत्स रस हा दाखवू नये असा संकेत असला तरी कलाकाराने या शिल्पात तो अत्यंत सूचकतेने दाखवला आहे.) वेरुळमध्ये (कैलास लेणे) गजासुरवध आणि अंधकासुरवध या शिल्पांमध्ये शिवाचे उग्र रूप दाखवले आहे. अन्य असुरवध शिल्पांमध्ये मात्र त्याच्या चेहऱ्यावर सौम्यच भाव आहेत. भैरवाची एकूण ६८ रूपे आहेत. त्या सर्वांची वेगवेगळी नावे आहेत. याशिवाय बटुक भैरव आणि स्वर्णाकर्षण भैरव अशीही रूपे आढळतात.

चित्र क्र. ८६ : भैरव, रानी की बाव, पाटण

गजासुरवध :-

    कूर्म पुराणात आलेल्या कथेप्रमाणे वाराणसीच्या कृत्तिवासेश्वर लिंगाचे पूजन करणाऱ्या ब्राम्हणांना त्रास देणाऱ्या हत्तीचा वेष घेतलेल्या एका असुराचा शंकराने संहार केला आणि त्याचे कातडे उत्तरीय म्हणून पांघरले. गजासुराच्या इतरही कथा आहेत. दक्षिण भारतीय परंपरेप्रमाणे शंकराने या आसुरांचा नाश तंजावर जिल्ह्याच्या बळूवूल गावात केला. (जोशी: १९७९, पृ.२००),

गजासुरवध वेरुळ  :-

   कैलास मंदिरात हे शिल्प महायोगी शिवाच्या बरोबर समोरच्या बाजूला कोरलेले आहे. भगवान शिवाचे एक आक्रमक रूप कोरलेले दिसून येते. नीलासुर हा राक्षस मातला आणि देवलोकांना त्रस्त करून सोडले. तेव्हा सर्व देवलोक श्रीशंकराकडे आले. शंकराने सर्व देवांकडे मागणी केली की या युद्धामध्ये तुम्ही सर्वांनी आपापल्या परीने साहाय्य करावे. तेव्हा देवतांनी आपापल्या शक्ती त्याच्या मदतीला पाठवून दिल्या. त्या शक्ती शिल्पांमध्ये शंकराच्या पायाशी बसलेल्या मातृकांच्या रूपाने दिसतात. शिवाने डमरूचा भयंकर नाद करत गजासुरावर आक्रमण केले. प्रथम त्याचा दात तोडला. शिल्पामधील शिवाच्या वळलेल्या मुठीतील दात हे त्याच्या निग्रहाचे प्रतीक आहे. तर गजासुराचे चामडे सोलून ते सूर्याजवळ धरले आणि जाळून टाकले. अशा त-हेने गजासुराला मारले. युद्ध पाहण्यासाठी पार्वती पण आली होती. शिवाचे ते अक्राळविक्राळ रूप, आकाशपर्यंत पसरलेल जटा, विस्फारलेले नेत्र, गळ्यात नररूडांची माळ आणि त्याचा युद्धोन्माद पाहून पार्वती हळूच तेथून सटकण्याच्या तयारीत आहे. शिवाच्या हे लक्षात आल्यावर त्याने त्याही स्थितीमध्ये तिचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. एका हाताने तिची हनुवटी हळुवारपणे धरून तो जणू तिला सांगायचा प्रयत्न करतो आहे की माझा हा आवेश गजासुरासाठी आहे. तुझ्यासाठी मात्र प्रिये, मी भोळासांबच आहे. कथेतील हा भाग शिल्पकाराने या शिल्पात हुबेहूब साकारलेला आहे.

चित्र क्र. ८७ : गजासुरवध, कैलास मंदिर, वेरूळा

अंधकासुरवध :-

    ही कथा वराह, कूर्म आणि वामन पुराणात येते. ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत झालेला हा असुर देवांना अतिशय त्रास देऊ लागला. ते शंकराकडे गा-हाणे घेऊन गेले असता अंधकासुराने शंकरावरच आक्रमण केले. शंकराने त्याला शूलावर उचलून घेतले. त्याच्या जखमांमधून गळणारे रक्तबिंदू जा जमिनीवर पडले तर त्यापासून पुन्हा एक असुर निर्माण होऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून शिवाने आपल्या डोळ्यापासून योगेश्वरी (काली) नावाची एक मातृका उत्पन्न केली. तिने आपल्या हातातील कपालामध्ये ते थेंब धरले आणि त्या युद्धात शिवाने अंधकासुराचा नायनाट केला. हे शिल्प वेरुळमध्ये अनेक ठिकाणी दिसते. परंतु त्याचा सर्वोत्कृष्ट आविष्कार दशावतार लेंणे (क्र.१५) मध्ये दिसतो. शिवाने अंधकासुराला म्हणजे अज्ञानाच्या राक्षसाला भाल्याच्या टोकावर घेतले आणि दूर अंतराळात भिरकावून दिले. ही क्रिया या शिल्पामध्ये अत्यंत आवेशपूर्ण दाखविली आहे. परंतु दैवीकरण करणे म्हणजे काय तर हेच कृत्य करायला माणसाला प्रचंड शक्ती वापरायला लागली असती. तर इथे मात्र शिवाने अत्यंत लीलया हे केल्याचे शिल्पकाराने कोरले आहे. त्या अचाट शक्तीला पाहून प्रभावित झालेली पार्वती शेजारी कोरलेली आहे. अंधकासुराच्या शरीरातून पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीन अंधकासुर जन्माला येणार म्हणून ते पडणारे थेंब गोळा करायला कपाल घेऊन काली शिवाला साहाय्य करीत आहे. कालीचा अजस्त्र आकार शिल्पामध्ये चपखलपणे
सामावलेला आहे. इथे कलाकाराला असे वाटले की, शिवाने भाला जर एवढ्या जोराने भोसकला असेल तर अंधकासुराच्या शरीरातून रक्ताबरोबर मांसाचेही तुकडे उडू शकतात, त्यांना हवेतल्या हवेत झेलण्यासाठी कलाकाराने एका उडणाऱ्या गरुडालाही शिवाच्या कपाल धरलेल्या हाताखाली कोरलेले आहे.शिल्पाचा विशाल आकार, त्यातील पात्रांची संरचना आणि यांचा आवेश हे सगळेच थक्क करणारे  !

चित्र क्र. ८८ : अंधकासुरवध, कैलास मंदिर, वेरूळ

त्रिपुरांतकमूर्ती :-

  त्रिपुर संहाराची कथा महाभारतात आहे. तारकासुराचे तीन मुलगे विद्यन्माली, तारकाक्ष आणि  कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून तीन किल्ल्याचे स्वामित्व मिळविले आणि असाही वर प्राप्त करून घेतला की हे किल्ले त्यांच्या इच्छेप्रमाणे फिरत असावेत. हजार वर्षात एकदा ते एका बिंदूवर यावेत आणि त्यावेळी एकाच बाणाने कोणी त्यांना पाडले तरच ते विनष्ट होऊ शकतील. मयासुराने त्या सोने, चांदी, व लोखंडाचे किल्ले बांधून दिले. याप्रमाणे बलवान होऊन त्यांनी देवांना अतिशय छळण्यास प्रारंभ केला. लिंगपुराणातील कथेत (७,२-४). शेवटी शंकराने मेरूपर्वताचे धनुष्य करुन त्याला वासुकी नागाची प्रत्यंच्या जोडून एक बाण ठराविक क्षणी मारून असुरांचा नाश केला व देवांची सुटका केली. (ढाल : २०००, पृ.२१४).
   या कथेचा अन्य काही तपशिलही अनेक ठिकाणी आढळतो. शंकराने पण या असूराचा नाशासाठी देवांच्या शक्तीची मागणी केली. त्याप्रमाणे सर्व देवांनी या युद्धात सहकार्य केले. शंकराने  विष्णू, अग्नी, आणि यम यांचा बाण केला. मेरू पर्वताचे धनुष्य केले आणि त्यासाठी वासुकी सापाची प्रत्यंचा केली. पृथ्वीचा रथ केला, मंदर पर्वताचा अक्ष करून त्यावर चाके म्हणून चंद्र आणि सूर्य बसविले, उपचक्र म्हणून हिमालय आणि विंध्याद्री पर्वत बसविले. सप्तर्षीना चाकावर गोलाकार बसवून चाके सुशोभित केली. गंगा, सरस्वती आणि सिंधू या नद्या चाकाच्या अक्षाच्या खिट्ट्या झाल्या. आकाश रथाचे छप्पर झाले, त्यांच्या रथाला चार वेदांचे अश्व जोडले. सर्पराज कालपृष्ठ, नहुष, करकोटक आणि धनंजय हे घोड्यांना बांधणारे पट्ट झाले तर कृति, सत्य, वैराग्य आणि ऐश्वर्य हे घोड्यांचे लगाम झाले. सोम अग्नि आणि विष्णू शंकराचा बाण झाले. ज्यात अग्नी हा बाणाची दांडी झाला. सोम बाणाचे शीर्ष झाला आणि स्वतः श्रीविष्णू बाणाचे टोक झाले. (डॉनिजर : १९७५, पृ.१२७-१३२).
 त्रिपुरांतक मूर्ती या घटनेची जाणीव करून देते. येथे शिवाचे धनुष्य, बाण किंवा शरसंधान ह्या महत्वाच्या गोष्टी होत. दक्षिण भारतामध्ये या मूर्ती अधिक दिसतात. आगम साहित्यात याचे पुष्कळ वर्णन येते. त्यात त्याचे आठ प्रकार सांगितलेले आहेत. वेरुळमध्ये याचे कैलास आणि दशावतार लेण्यात शिल्प दिसते.
        वेरुळमधील शिल्पांमध्ये दोन्ही पायात अंतर घेऊन शिव रथावर उभा असल्याचे दाखवले जाते. यातून अत्यंत गतिमान अशा रथावर त्याने तोल सांभळण्यासाठी घेतलेला पवित्रा लक्षात येतो. धनुष्यावर बाण दिसत नाही. परंतु शिवाचा उजवा हात कानाजवळ दिसतो. आकर्ण धनुष्य ओढून त्याने नुकताच तो बाण सोडल्याचे स्पष्ट होते. बाण सुटल्याने असुरांचा नाश झाला असल्यामुळे ते दशावतार लेणीतील शिल्पपटात कोरलेले दिसत नाही. परंतु कैलास लेण्यातील शिल्पपटात मात्र दोन असुर वर आणि एक असुर मारला गेल्यामुळे तो आकाशातून पडताना दिसतो. कैलास लेण्यात आणि दशावतार लेण्यात घोडे आणि रथ हे काटकोनात असलेल्या भिंतींच्या कोपऱ्यावर कोरलेले आहेत. कलाकाराच्या या कल्पकतेमुळे या दृश्यातील रथाला गतीचा आभास झाल्यासारखा दिसतो.
    तमिळनाडूमधील तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या भोवती दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भिंतीवर प्रत्येकी सहा देवकोष्ठ असून त्या सर्व देवकोष्ठांमध्ये शिवाची त्रिपुरांतक श्रेणीतील अगदी वेगळी शिल्पे आहेत. या देवळाच्या गर्भगृहाबाहेरील दर्शनी भिंतीची लांची जवळजवळ ४० फूट असून त्याची उंचीही जवळजवळ तेवढीच आहे. यामध्ये सहा सहा देवकोष्ठांचे दोन थर आहेत. त्यातील वरच्या थरामध्ये डाव्या हातात उभे धनुष्य आणि उजव्या हातात एक बाण पालेल्या शिवाच्या अठरा मूर्ती आहेत. प्रथम दर्शनी तर ही श्रीरामाचीच मूर्ती वाटते. कारण शिवाने डाव्या हातात धरलेले नुष्याचे एक टोक जमिनीला टेकलेले असते तर दुसरे त्याच्या डोक्याहूनही वर गेलेले आहे. मेरू पर्वताचेच धनुष्य ते, लहान कसे असणार. अन्यथा शिवाचे पिनाक हे धनुष्य सांबराच्या सिगापासून केलेले असल्यामुळे अन्य मूर्तीमध्ये ते लहानसेच दाखवले असते. बृहदीश्वर मंदिरातील या सर्व शिवाच्या मूर्ती जिगुरांतक शिव याचीच शिल्पे आहेत (नागास्वामी : २०१०).

चित्र क्र. ९० : त्रिपुरांतक, बृहदीश्वर मंदिर, तंजावर

चित्र क्र. ८९: त्रिपुरांतकमूर्ती, कैलास मंदिर, वेरुळ


शिवाच्या अन्य मूर्ती

सदाशिव मूर्ती :-

     पाच तोंडाचा व दहा हातांचा शंकर हा 'सदाशिव' या नावाने ओळखला जातो. तसेच अनेक मुखांच्या शंकराच्या मूर्तीलाही सदाशिव म्हटले जाते. अशा वर्णनाच्या काही विशेष मूर्ती आढळतार परंतु साधारणपणे अनेक मुख असणाऱ्या शंकराच्या शिल्पाला सदाशिव म्हणतात. तत्पुरुष, वामदेश अघोर, सद्योजात, आणि ईशान अशी याच्या पाच मुखांची नावे असतात. मूर्तीमध्ये हा तीन किंवा चा तोंडाचा दिसतो. त्याचे समोर मध्यभागी असणाऱ्या मुखाला तत्पुरुष असे म्हणतात. त्याचा डावीकडील वामदेव तर उजवीकडील मुखाला अघोर म्हणतात. डोक्यावरील मुखाला ईशान म्हणतात तर पाचवे मुख जे दिसत नाही त्याला सद्योजात म्हणतात. ही पाच मुखे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित करतात. यातील डोक्यावरील मुख ईशान हे आकाश तत्त्वाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे ते काही शिल्पांमध्ये दाखवले जात नाही. घारापुरी (एलिफंटा) येथील त्रिमूर्ती या नावाने प्रसिद्ध असलेले शिल्प हे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवतांचे नसून सदाशिवाचे शिल्प आहे. या शिल्पात तीनच मुखे दिसतात आणि डोक्यावरील ईशान दाखवलेला नाही. शिवाच्या डावीकडील तोंडाचे नाव वामदेव. वामदेव म्हणजे परिष्कृत निर्मिती म्हणून याचा चेहरा अत्यंत सुकुमार तरुणाप्रमाणे कोरलेला आहे. त्याचे उजवे तोंड म्हणजे अघोर. यातील अघोर म्हणजे निर्मिती साठी लागणारी ऊर्जा आणि शक्तीचे रूप. हातोडीचा ठोका कठीण पदार्थाबर घालताना दाताखाली ओठ चावून भुवया विस्फारून अत्यंत त्वेषाने तेवढाच नियंत्रित आणि संयमित करून तो ठोका घालावा लागतो याचे ते प्रतीक आहे. या शिल्पातीत अघोराने चावलेला ओठ आणि त्याची वक्र झालेली भुवई यांची साक्ष देतात. या दोन्हीतील समतोल साधणारा निःपक्ष म्हणूनच निर्विकार तरीही निर्मितीचे समाधान दाखवणारा चेहरा हा मधल्या तोंडावर म्हणजे तत्पुरुषाचा असतो, घारापुरीतील हे शिल्प खरं तर अर्धशिल्पच (bust) आहे. शंकराच्या छातीपर्यंतच कोरलेले हे शिल्प आहे. हे शिल्प २१ फूट उीचे आहे. अर्धशिल्पांमध्ये जगातील सर्वात श्रेष्ठ असे हे शिल्प आहे.

एकपाद शिव मूर्ती :-

    ही शिल्पे संख्येने अतिशय कमी असतात आणि साधारणतः तांत्रिक पंथाच्या मंदिरात ही दिसतात. यामध्ये कमरेवरील शंकराचे शरीर पूर्ण असते आणि कमरेखाली एकच पाय दोन्ही पायाच्या जागी कोरलेला असतो. या शिल्पात शंकर ऊर्ध्वलिंगी दाखवलेला असतो. भुवनेश्वर उबळील हीरापूर येथील चौसष्ठ योगिनींच्या मंदिरात हे शिल्प दिसते.

चित्र क्र. ९२ : विलक्षण चतुष्पाद सदाशिव, खजुराहो

चित्र क्र. ९१: एकपाद शिव, हीरापुर

   खजुराहो येथील खंडारीया महादेव मंदिरामध्ये हे शिल्प दिसते. आणखी एक शिल्प खजुराहो येथील संग्रहालयात आहे. या शिल्पात आठ तोंडाचा शिव म्हणजे दर्शनी भागात खांद्यावर तीन मुखं आणि त्याच्यावर तीन छोटी मुखे, या दोन्ही स्तरांमध्ये चवथे मुख मागील बाजूला आहे हे गृहीत धरले जाते. अशी त्याच्या आठ मुखांची रचना आहे. डोक्यावर मध्यभागी शिवलिंग कोरलेले आहे. या मूर्तीला चार पाय असून त्यातील दोन पाय पद्मासनात आणि खाली सोडलेले दोन पाय जमिनीवर टेकलेले दिसतात. या मूर्तीला बारा हात होते. परंतु आता त्यातला एकच शिल्लक आहे. चतुष्पाद म्हणजे चार पायांचा. या ठिकाणी पाद शब्दावर श्लेष केलेला आहे. शैव पंथांच्या अनुयायांसाठी चार मार्ग किंवा चार पाद सांगितले आहेत. शैव सिद्धान्तामधील हे चार मार्ग म्हणजे योग-पाद, ज्ञान- पाद, क्रिया-पाद आणि चर्या-पाद. सदाशिवाच्या
पद्मासनात असलेले दोन पाय म्हणजे ज्ञान आणि योग पाद होय आणि खाली सोडलेले दोन पाय क्रिय पाद (उपासना पद्धत) आणि चर्या पाद (आचरणाचे नियम) होय. केवळ या मूर्तीच्या दर्शनाने भक्तांन जीवनात मुक्ती देणाऱ्या चार मार्गांचे स्मरण व्हावे अशी यांची योजना आहे.

 चित्र क्र. ९३ : एकादश रुद्र, कैलासनाथ मंदिर, कांचीपुरम

    ज्या शिल्पातून सगळे तत्त्वज्ञान साकारले जाते, अशा शिल्पांना डॉक्टर गो. बं. देगलूरकर यांचा मते 'बिंब ब्रह्म' असे म्हणतात. याशिवाय अष्ट मुख आणि द्वादश मुख शिव अशीही शिवाची शिले असतात. काही शिल्पांमध्ये सिंहासह शिव कोरलेला असतो.
    शिवाचे शिल्पांकन अनेक प्रकारे होते. त्यातील सर्वच प्रकार सर्व मंदिरात दिसत नसल्यामुळे येथे सर्वाधिक प्रचलित आणि संख्येने जास्त असणाऱ्या तसेच सामान्यतः अनेक देवळांमध्ये प्रकर्षनि आढळणाऱ्या शिल्पांचेच वर्णन प्रामुख्याने केले आहे. अकरा रुद्र यांचे एकत्रित किंवा स्वतंत्र शिल्पांकन दिसते. (कांचीपुरम - तामिळनाडू येथील कैलासनाथाचे मंदिर, सिद्धापूर-गुजराथ येथील शिव मंदिर) तसेच अज मुख, अघोर, नीलकंठ, वीणाधर, हनुस्पर्श (पार्वतीच्या हनुवटीला हात लावलेला बालशिव, विषपायी आवक्ष, महेशमूर्ती अशी विविध रूपेही दिसतात. (जोशी : १९७९, पृ.२०२- २०३).
    तालागाव (बिलासपूर, छत्तीसगढ) येथे दहाव्या अकराव्या शतकातील रुद्र शिवाची एक उभी असलेली द्विभुज प्रतिमा मिळाली आहे. ही ऊर्ध्वलिंगी असून हातात आयुधे नाहीत. त्यांच्या संपूर्ण शरीरावर विविध प्राणी अंकित केलेले आहेत. छाती, पोट, मांड्या यावर सात मानव मुखे आहेत. गुडघ्याच्या ठिकाणी दोन सिंहाची तोंडे दिसतात. पोट हे महाकुर्माचे रूप, भुवयां ऐवजी मासे, एका विशाल कपाळावर टिळ्याच्या ऐवजी पाल, बुबुळाऐवजी मानवी कवट्या, याशिवाय डोके, कान, लिंग यासारख्या अवयवांवर साप, मोर, मगर वगैरे प्राणीही लहानमोठ्या प्रमाणात दिसतात. डॉ. देगलूरकर झांनी याला 'सर्वभूतवहित्र' असे म्हटले आहे.
    पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये एक द्विभुज मूर्ती आहे. त्याच्या माथ्यावर आधी तीन फणांचा व त्याखाली पंधरा फणांचा नाग आहे. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याला दाढी असून त्याच्या डाव्या हातात नाग आणि उजव्या भग्नावस्थेत असलेल्या हातात बटवा आहे. सर्पाच्या साहाय्यात असत्यामुळे श्री. नि.पु. जोशी (जोशी: १९७९) यांनी याला धन्वंतरी शिव असे म्हटले आहे. डॉक्टर देगलूरकरांच्या मते (देगलूरकर : २००७) ही धन्वंतरीचीच मूर्ती असून हे विष्णूचे रूप असल्याचे म्हटले आहे.

शिवाची १ ०८ रुपे

shivtuzenaam

महादेव

 वीरूपाक्ष

 चंद्रार्धककृतशेखर

 अमृत 

शाश्वत

 स्थानू

 नीलकंठ

 पिनाकी 

वृषाभाक्ष

 महाज्ञेय

 पुरुष

 सर्वकामद

 कामारी

 कामदहन

 कामरूप

 कपर्दी 

विरूप

 गिरीश

 भीम

 सॄक्की (म्हणजे मोठे मोठे जबडे वाले)

 रक्तवासा

 योगी

 काल दहन

 त्रिपुरघ्न

 कपाली

 गूढव्रत 

गुप्त मंत्र 

गंभीर

 भाव गोचर 

अणिमादीगुणाधार

 त्रिलोकेश्वर्यदायक

 वीर

 वीरहंता

 घोर

 विरूप

 मासल

 पटू 

महामासाद

 उन्मत

 भैरव

 महेश्वर

 त्रैलोक्यद्रावण

लुब्ध

लुब्धक

 यज्ञसूदन

 कृतिकासुतयुक्त 

उन्मत 

कृत्तीवासा

 गजकृत्तीपरिधान

 क्षुब्द 

भुजंग भूषण

 दत्तालंब

 वेताल

 घोर 

शाकिनी पूजित

 अघोर

 घोरदैत्यग्न

 घोरघोष

 वनस्पती

 भस्मांग 

जटिल 

शुद्ध 

भेरुड शतसेवित

 भूतेश्वर 

भूतनाथ

 पंचभूताश्रित

 खग

 क्रोधित

 निष्ठूर

चंड

 चंडिश 

चंडिका प्रिय

 चंडतुंड

 गरुत्मान

निस्त्रिश

शव भोजन

 लेलिहान

 महारौद्र

 मृत्यू 

मृत्यूर गोचर

 मृत्योमृत्यु

 महासेन

 स्मशानारण्यवासी

 राग 

विराग

 रागांध

 वितराग

 शतार्ची

 सत्व

 रज 

तम 

धर्म 

अधर्म

 वासनवानुज

 सत्य 

असत्य

 सदृप 

असदृप 

अहेतुक 

अर्धनारीश्वर

 भानू 

भानुकोटीशतप्रभ 

यज्ञ 

यज्ञपती

 रुद्र

 ईशान

 वरद

 शिव

शिवाची १ ०८ रुपे

१०. स्त्री देवता (शक्ती) आणि त्यांच्या मूर्ती

चित्र क्र. ९४ : तपस्विनी पार्वती, रानी की वाव, पाटण

स्त्री देवता :-

   सर्व आदिम समाजामध्ये शक्तीच्या उपासनेला महत्त्वाचे स्थान होते. तसेच इराण, मेसोपोटेमिय तुर्कस्थान, इजिप्त, आदी संस्कृतींपासून तर सिंधू-सरस्वती संस्कृती पर्यंत यांच्या पूजनाचे पुरावे सापडतात. भारतामध्ये इ.स.पू. २५०० ते इ.स.पू. ३ऱ्या शतकापर्यंत मातीच्या मातृका मूर्ती सापडतात. या मूर्तींचे आकार फार सुडौल नसून अलंकरणयुक्त परंतु वस्त्रहीन अशाच मूर्ती मिळतात. मूर्तिशास्त्राचा विकास झाल्यानंतर या मातृकामूर्तीऐवजी स्त्री देवतांचे पूजन आणि शिल्पांकन झालेले दिसते. गुप्त काळाच्या आधीच्या शिल्पांमध्ये स्त्री देवतांच्या शिल्पांकनांचे महत्त्व होते. परंतु त्याची नावे वसुधारा, एकानंशा अशा प्रकारची होती, ज्यामधून लक्ष्मीचा उगम झाला. या लक्ष्मी बरोबरच सप्तमातृका आणि चौसष्ठ योगिनींचाही उगम झालेला दिसतो आणि त्यांच्याही शिल्पांकनाची सुरुवात गुप्त काळामध्ये (इ.स. ४ थे ते ६ वे शतक) झालेली दिसते. पुढे यामध्ये भर पडून दर्गा, महिषासुरमर्दिनी, पार्वती आणि गंगा, यमुना आणि सरस्वती या नदी देवतांच्या प्रतिमा मंदिरातल्या शिल्पांवर मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या. लक्ष्मी साधारणतः लक्ष्मीच्या शिल्पात कमळावर बसलेली किंवा उभी असलेली स्त्री मूर्ती दिसते आणि शेजारी हत्ती दाखवले जातात. 
चित्र क्र. ९५ : महिषासुरमर्दिनी,उदयगिरी लेणे, विदिशा
 
   वेरुळ (क्र. १६) कैलासमंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर गजांतलक्ष्मीचे मोठे शिल्प दिसते. ती कमळावर बसलेली आहे. कमळाचे शिल्पांकन हे हिंदू मंदिरामध्यान वैशिष्ट्यांपैकी एक आहे. कमळ पाण्यात असूनही अलिप्त असते. त्याच्या पानांवर पडलेले पाणीसुद्धा ओघळून जाते. जीवन हे क्षणभंगुर आहे हे जरी खरे असले तरी त्यातील प्रत्येक क्षण सौंदर्याने भारलेला आहे याचेच हे निदर्शक आहे. जीवनाचे प्राथमिक प्रतिक म्हणजे जल, त्यातून प्रकटणारे सदाबहार जीवनाचे प्रतिक म्हणजे कमळ. जन्मदात्री, नवजीवन देणारी, प्रजनन करणारी ही माताच असू शकते म्हणून निसर्ग देवता ही सौष्ठवपूर्ण स्त्रीरूपानेच समर्पकपणे दाखवता येते. शिल्पकारानेही ती तशीच कोरलेली आहे. निर्मितीचा आनंद जणू शिशुला स्तनपान करताना होणाऱ्या समाधानासारखा तिच्या चेहर्यावर आहे. गजलक्ष्मीच्या दोन्ही बाजूला दोन दोन हत्ती जलाने कलश भरताना कोरले आहेत. पाणी भरताना कळशी पाण्यात बुडविल्यावर थोडी हाताने पाण्याखाली दाबावी लागते हे कलाकाराच्या सूक्ष्म निरीक्षणात होते म्हणून शिल्पामधील हत्ती कळशी भरण्यासाठी त्याची तोंडं सोंडेत धरून ती पायाने पाण्याखाली दाबताना दाखवायचे तो विसरला नाही. त्या हत्तीच्या थोड्या बाच्या अंगास दुसरे दोन मोठे हत्ती आहेत. ते भरलेले जलकुंभ घेऊन त्याचा तक्ष्मीच्या डोक्यावर अभिषेक करीत आहेत. येथे हत्ती हे मेघाचे प्रतिक आहेत तर अभिषेक म्हणजे पर्जन्य. बहरून बेगारी सृष्टी म्हणजे लक्ष्मी. हे चक्र अव्याहतपणे सतत चालू आहे हे सूचित करण्यासाठी हत्तींच्या पाठीवरील झुलीतून लटकणाऱ्या घंटा हिंदोळ्याने मागे गेलेल्या आहेत. ही त्या शिल्पीची कल्पकता विलोभनीय आहे.
चित्र क्र. ९६ : अभिषेक लक्ष्मी, कैलास मंदिर, वेरूळ

  दुर्गा :-

   दुर्गेचे पुजन प्राचीन काळापासून होत होते असे ग्रंथांमधल्या पुराव्यावरून दिसते. तैत्तरीय आरण्यक, केनोपनिषद, बात अविका आणि हैमवती अशी शिवाच्या पत्नीची, उमेची नावे दिसतात. तसेच महाभारतात विराट आणि भीष्म पर्वात दुर्गेची दोन मोठी स्तोत्रे आहेत. देवळामधील शिल्पात ती सिंहवाहिनी, सिंहावर आरूढ किया सिहाशेजारी दाखवली जाते. बेरुळमध्ये लेणे क्र.१६ कैलास लेण्यातील यज्ञशाला येथे याचे प्रभावी शिल्पांकन आढळते. दुर्गेची आयुधे म्हणून वज्र, तलवार, ढाल, शूल, त्रिशूळ, अंकुश, धनुष्य, बाण, चक्र, डमरू, अक्षमाला, शंख, पद्म, घंटा, परशु वगैरे वस्तू निरनिराळ्या प्रतिमांतून दिसतात. तिच्या हाताच्या संख्येप्रमाणे तिची वेगवेगळी नावे असतात. चार हातांच्या शिल्पांमध्ये नवदुर्गा येतात. त्याचे नावे महालक्ष्मी, नंदा, क्षेमांकाली, शिवदूती, महाचंडा, भ्रामरी, सर्वमंगला, रेवती आणि हरसिद्धों हे आहेत. दहा हाताची असल्यास कात्यायनी, अठरा हातांची असल्यास भद्रकाली, सोळा किंवा अठरा हातांची दुर्गा अशा प्रतिमा दिसतात. याशिवाय चार किंवा आठ हातांची चामुंडाही असते. (जोशी १९७९,१.२९३)
चित्र क्र. ९७ : दुर्गा, लेणे क्र. १४, वेरूळ

महिषासुरमर्दिनी :-

   सर्व देवांच्या शक्तीपासून तयार झालेली ही देवी महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्याल जन्माला आली अशी तिची कथा आहे. हे दुर्गेचेच एक रूप आहे. विदिशा जवळील उदयगिरी लेण्यामध्ये (इ.स.५ वे शतक) जे शिल्प आढळते यामध्ये तिची केशरचना अत्यंत विशेष असून महिषाच्या मागच्या पायाने तिने धरलेले असून त्याचे डोके पायाखाली घेतलेले शिल्प आहे.या शिल्पामध्ये दुर्गेप्रमाणेच तिच्या हाताच्या संख्येत वाढ झालेली दिसते आणि ११ व्या शतकाप अठरा हातांची शिल्ये आपल्याला आढळून येतात.
   साधारणतः ७ व्या शतकापर्यंत महिषासुर हा रेड्याच्या रूपातच दाखविला जात असे. वेरुळ मधल्या रामेश्वर लेण्यात ( क्र.२१) आणि रावण की खाई (क्र.१४) आणि कैलास मंदिर (क्र.१६) यामध्ये हिची विराट शिल्पे आहेत. रामेश्वर लेण्यातील शिल्पात एका प्रचंड रेड्याचे तोंड चार हातांच्या देवीने तिच्या खालच्या डाव्या हाताने धरलेले असून तिच्या उचललेल्या डाव्या हातात चक्र आहे. तिच्या खालच्या उजव्या हातात उगारलेली तलवार असून तिचा वरचा उजवा हात रेड्यावर वार करायला उगारला आहे. तिने उजवा पाय महिषाच्या पाठीवर ठेवला असून त्या सहज क्रियेने देखील त्या विशाल महिषाचे गुडघे मुडपल्याचे दाखवून शिल्पकाराने देवीच्या अगाध शक्तीचे दर्शन घडवले आहे. कैलास मंदिरातील अशा शिल्पामध्ये ती अष्टभुजा सिंहारूढ आहे. इथे तिचा बांधा अधिकच सुडौल आहे. महिषाचे मुंडके तिने उडविल्यावर महिषाच्या पटातून असुर उसळी मारून बाहेर पडलेला दाखवला आहे. तो मानवी रूपात परंतु डोक्यावर शिंग असलेला दिसतो. देवीने त्याच्या छातीत त्रिशूल खुपसलेला आहे.
चित्र क्र. ९८ : महिषासुरमर्दिनी, रानी की वाव, पाटण

आठव्या शतकानंतर महिषासुराच्या शिल्पाचे मुंडके अर्धे कापलेले दाखविलेले जाते आणि आतून कमरेपासून डोक्यापर्यंत एक शिंगधारी मनुष्य बाहेर पडताना दिसत असे. देवीने मारल्यानंतर महिषासुर आपले खरे रूप प्रगट करताना दाखवले जायचे. दहाव्या शतकानंतर संपूर्णपणे मानव रूपाचा असले तरी या शिल्पांकनाला सर्वसाधारण नियम असे म्हणता येणार नाही. उदयपूर (राजस्थान) जवळ जगत येथील दहाव्या शतकात बांधलेल्या देवीच्या मंदिरात महिषासुरमर्दिनीची ही तिन्ही रूपे येथे घोषासुर म्हणजे शिंगधारी माणसाच्या छातीत त्रिशूळ भोसकून बध करताना दाखविले जायचे. असे शिल्पात दिसतात. पाटण येथील राणी की वाव (११ वे शतक) येथे अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीचे सातील सर्वोत्कृष्ट शिल्पांपैकी एक आहे.

पार्वती :-

शिव पार्वती असे हिचे शिवा बरोबरचे शिल्पांकन सर्वत्र दिसते. परंतु पार्वतीचे स्वतंत्र शिल्पांकनही अनेक ठिकाणी असते. तिच्या हातांमध्ये त्रिशूळ, अंकुश, पार्श किंवा शिवलिंग अशी आयुधे असतात. तिचे वाहन घोरपड असते. वेरुळ मध्ये २२ क्रमांकाच्या लेण्यात आणि खजुराहोच्या संग्रहालयात असलेल्या शिल्पात असे शिल्पांकन आहे. तिचा शिवाशी विवाह होण्यासाठी तिने तप केले होते. विवाहपूर्वीच्या पार्वतीला गौरी म्हणतात. काही वेळेला तिच्या शेजारी सिंह किंवा हरिण ही वाहनेही असतात. रानी की वाव, पाटण येथे तप करण्याऱ्या पार्वतीची बारा शिल्पे आहेत. यातील एका शिल्पात ती चतुर्भुज असून एका पायावर उभे राहून तप करतानाचे शिल्पांकन आहे. तिच्या वरच्या उजव्या हातात अक्षमाळा असून तिचा खालचा उजवा हात सरळ खाली सोडलेला असून तो तिच्या दुमडलेल्या उजव्या पायावरून (वृक्षासनात जसा एक पाय दुमडलेला असतो तसा) खाली भूमी स्पर्श मुद्रेप्रमाणे दाखविलेला आहे. तिच्या वरच्या डाव्या हातात दंड असून खाली सोडलेल्या डाव्या हातात कमंडलू आहे. तिचे हे तपस्विनीचे रूप अधिक ठळक करण्याकरता कलाकाराने तिच्या गळ्यात यज्ञोपवीत आणि कमरेला लंगोट दाखवलेला आहे.  रानी की बाब सेवेत अपघात एका शिल्पात तिच्या पायाखालील घोरपड स्पष्ट दिसते. वेरुळ येथील रामेश्वर लेणे (क्र.२१) आतील शिल्यपटावर तप करणाऱ्या पार्वतीचे शिल्प आहे. येथे तिच्या पायाखाली घोरपड नाही. परंतु तिच्या भोवती चार ज्वाळा पेटलेल्या दाखविल्या आहेत. या चार ज्वाळा आणि डोक्यावरील तळपणारा सूर्य अशा पाच अग्नींमध्ये बारा वर्षे उभे राहून तिने शंकरच पती मिळावा म्हणून तप केले. या तपाली 'पंचाग्नी तप' असे म्हणतात.
चित्र क्र. ९९: पार्वती, रानी की वाव, पाटण

    गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे मानवीकरण या शिल्पांद्वारे करण्यात आले. शृंग काळामध्ये (इ.स.पू २ ते १ शतक) याच्या भोवती असणाऱ्या तोरणाखाली शालभंजिकांचे शिल्पांकन आढळते. झाडाच्या फांदीला एका हाताने धरून देहुड्यापावली उभ्या असणाऱ्या शालभंजिकांची त्या काळची अनेक शिल्पे दिसतात. गुप्त काळामध्ये या शालभंजिकां- प्रमाणे गंगा आणि यमुना यांचे शिल्पाकंन इाले. उदयगिरी (म.प्र.) मधील लेण्याच्या गृहाबाहेरील द्वारशाखेवर या तुळईच्या बहेरील कोपऱ्याशेजारी या दोन्ही कोरलेल्या दिसतात. त्याच लेणीमध्ये बाहेरच्या भिंतीवर असणाऱ्या वराहाच्या भव्य शिल्पाशेजारी न्टपणे दिसतात. यामध्ये यांची वाहनेही दाखवलेली आहेत. गंगेचे वाहन मकर आणि यमुनेचे वाहन कासव असते. ते यांच्या पायाखाली कोरलेले आहे. कालांतराने सातव्या शतकानंतर या द्वारशाखेवरच परंतु खालच्या बाजूला कोरल्या जाऊ लागल्या. मंदिरात प्रवेश करताना आपल्या डावीकडे असते ती मकर बाहिनी गंगा आणि उजवीकडे असते ती कच्छपवाहिनी यमुना. वेरुळमध्ये एवं अप्रतिम शिल्पांकन पाहायला मिळते. रामेश्वर लेणे (लेणी क्र. २१) याच्या बाहेर असलेली यमुना आज भग्न अवस्थेत आहेत. परंतु तेथील गंगेचे शिल्प हे भारतातील सर्वश्रेष्ठ शिल्पापैकी एक म्हणावे लागेल.. कवी कालिदासाच्या मेघदूतातील केलेल्या कल्पनेतील स्त्रीसौंदर्याची व्याख्या इथे प्रत्यक्षात साकारलेली आहे. 
      'उन्दी श्यामा शिखरिदशना पक्कबिंबाधरोष्ठि ।
       मध्ये शामा चकित हरिणी प्रेक्षणा निम्ननाभिः ||
       श्रोणीभादलसगमना स्तोकनमा स्तनाभ्याम् ।
        या तत्र स्याद्यवतिविषये सुष्टिराद्येव धातुः ।।' (मेघदूत: २.२२)
चित्र क्र. १०० : गंगा, रामेश्वर लेणे, वेरूळ

  मानवी शरीराच्या बाह्यरेखा उठावदारपणे आणि सौष्ठवपूर्ण दिसण्यासाठी स्त्री शिल्पे ही त्रिभंग अवस्थेत कोरली जातात. त्रिभंग म्हणजे पाय, घड आणि डोके सरळ रेषेत न येता ते तीन वेगळ्या कोनांमध्ये काढले जातात त्यामुळे शरीराला एका लाटेप्रमाणे बाक येऊन स्त्री देहाचे सौष्ठव अधिक उठावदार आणि भारदस्त दाखवले जाते. गंगेचे वाहन मकर. इथे मकराला हत्तीचे तोंड आणि सिंहाचे पाय दाखवले आहेत. तरीही एका जलचर प्राण्याचाच भास मूर्तीवरील खवल्यांमुळे होतो. मकरावर उभ्या असलेल्या गंगेच्या डोक्यावर किरीट आहे. त्यातून कपाळावर ओघळलेला चूडामणी, कानामध्ये ताटंक चक्र, गळ्यामध्ये कंठी, माला आणि हार, दंडावर केयूर, मनगटात कंकण, कमरेत मेखला, पायात नुपूर इतके अलंकार तिने धारण केलेले दाखवले आहेत. नदी असल्यामुळे तिचे तलम वस्त्र ओले आहे हे दाखविण्यासाठी वस्त्रातून उमटणाऱ्या डाव्या गुढग्याची वाटीची बाहह्यरेखा सुस्पष्ट करून कलाकाराने अपूर्व कल्पकता दाखविली आहे. आधारासाठी तिने एक गणाच्या डोक्यावर हात ठेवला आहे. गणाच्या थोड्याशा बेढब मूर्तींमुळे गंगेचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. तिच्या चेहऱ्यावरील मंद स्मित हे तृप्त, संतुष्ट आणि एका मोक्षदायिनीच्या उदात्त भावांचे मुख मीलन आहे. गंगेच्या शिल्पासमोरच कासवावर उभ्या असलेल्या यमुनेचे शिल्प रामेश्वर तोपान कोरलेले आहे.
चित्र क्र. १०१ : गंगा, कैलास मंदिर, वेरूळा

याशिवाय वेरुळ येथील कैलास लेणीमधील सरिता मंदिरात गंगा, यमुना यांच्या जोडील सरस्वतीचेही शिल्प कोरलेले आहे. राष्ट्रकूट राजाच्या कारकिर्दीत प्रयागचा संगमही त्याच्या राज्य सीमेत सामावलेला होता. त्याचे हे शिल्परूपी स्मरण, मधोमध मकरावर उभी गंगा आहे, उजवीकडे कासवावर उभी असलेली यमुना आहे आणि डावीकडे कमळावर उभी असलेली सरस्वती आहे. 
    सरस्वती आणि यमुना या अनुक्रमे उजवीकडे आणि डावीकडे वाकून त्रिभंगात उभ्या आहेत. गंगा मात्र सरळ उभी ठेवावी लागली कारण कुठल्याही एका बाजूला ती वाकल्याप्त संपूर्ण शिल्पपटाचे संतुलन ढळले असते. त्रिभंगासारखे न वाकवता शिल्पाच्या सौष्ठवाला कायम ठेवणे हे एक अवघड आव्हान होते. शिल्पकाराने ते कल्पकतेने पेलले आहे. गंगेच्या दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर दिलेले असल्यामुळे तिच्या कमरेचा बाक उठावदार होऊनही अनैसर्गिक वाटत नाही. सरस्वतीच्या शिल्पाला त्याने उभ्या तीन प्रतलातही वळविले आहे. त्यामुळे तिच्या कमरेला अत्यंत रेखीव असा बाक आला आहे. गंगा हे शुद्धता आणि पावित्र्याचे प्रतिक. दोन नद्यांचा संगम झाल्यावर पुढील प्रवाहास मोठ्या नदीचे नाव देतात. परंतु यमुना मोठी नदी असूनही गंगा-यमुनेच्या संगमानंतर पुढील प्रवाहास गंगेचेच नाव दिले गेले आहे. संगमानंतर यमुना स्वतःला गंगेत विलीन करते म्हणून ती भक्तीचे एक श्रेष्ठ प्रतिक ठरते. शुद्धता, पावित्र्य आणि भक्ती याशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाही. साम्यती ज्ञानाचे प्रतिक असल्यामुळे इथे मात्र कलाकारांनी तिन्ही नद्यांना मूर्त रूपात कोरले आहे.
चित्र क्र. १०२ : सरस्वती, कैलास मंदिर, वेरूळ
 
वाकाटक काळातील (इ.स.५-६वे शतक) मंदिरे आणि शिल्पे नष्ट झाली. त्यातील काही मंदिरे रामटेक मध्ये होती तेथील नरसिंहाची शिल्पे विशेष आहेत. पवनारचा आश्रम बांधत असताना तेथे काही शिल्ये मिळाली जी आचार्य विनोबा भावे यांनी अत्यंत काळजीपूर्वक उचलून सुरक्षित ठेवली.त्यातील गंगेचे शिल्प हे उभे करताना त्याला भिंतीचा आधार दिला. परंतु त्या शिल्पाचा मागील भाग अत्यंत भिंतीलगत आहे. त्यात गवंड्याने चुना आणि सिमेंट भरल्याने ते गवंड्याने भिंतीत चिणून टाकल्यासारखे दिसते. गंगेची ही पूर्णाकृती मूर्ती असून तिच्या उजव्या पायाच्या शेजारी ब्राह्मी लिपीमध्ये 'भगवती गंगा' असे लिहिले आहे. अतिशय तलम वस्त्र नेसलेल्या आणि त्यात नखशिखांत पाण्यात भिजलेल्या श्रीच्या रूपातील गंगेचे हे एक अप्रतिम शिल्प आहे.

 सप्तमातृका :-

    सप्तमातृका म्हणजे सात माता ! या निरनिराळ्या देवांच्या शक्ती किंवा त्यांनी प्राप्त केलेल्या सिद्धी होत. साधारणपणे जरी 'सप्त' मातृका असा उल्लेख केला गेला तरी त्यांची संख्या आठ किंवा त्याहूनही अधिक असू शकते. मातृकांची पूजा प्राचीन काळापासून प्रचलित होती. सप्तमातृकांच्या व्युत्पत्तीचा इतिहास थेट सरस्वती-सिंधू संस्कृतीच्या मातृदेवता पूजनाशी जोडत येतो. तेथील उत्खननामध्ये अशी एक मुद्रा सापडली आहे की ज्यात एका झाडाभोवती सात स्त्रीया नाचताना दिसतात. सप्त-मातृकांचा हा सर्वात जुना पुरावा आहे. यावरून हे नक्की सिद्ध होते की इसवी सन पूर्व काळापासून मातृकापूजन देशात सर्वत्र केले जात असे. ऋग्वेदात सप्तमातृकांचा उल्लेख येतो. 
     जज्ञानं सप्त मातरो बेधामशासत श्रिये। अयं ध्रुवो रयीणां चिकेत यत् ।। (ऋ. ९, १०२, ४).
       याचप्रमाणे अनेक पुराणात आणि अन्य ग्रंथांमध्येही यांचा उल्लेख आढळतो. स्कंद पुराणात (काशी खंड, ८-३३ उत्तरार्ध), देवी पुराणात (अध्याय ८७) आणि ब्रह्मवैवर्त पुराणात (६४, ८७-८८) यांची संख्या आठहूनही अधिक आहे. तर देवी भागवत (२, ११५७-५८), वामकेस्वरतंत्र नित्यसोडदासिकार्णव, प्रपंचसार तंत्र (अध्याय ३) आणि लिंग पुराणात (८२-९६) यांची संख्या आठच सांगितलेली आहे. (मिश्राः १९८९, पृ. १).
चित्र क्र. १०३ : सप्तमातृका, रामेश्वर लेणे, वेरूळ
 
      सप्तमातृकांची कथा महाभारतात येते. अंधक नावाच्या असुराला दैत्यांचे प्रमुखपद मिळाले. त्यारे घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून अनेक वर मागून घेतले. त्यामुळे तो अखंड शातिशाली आणि पर्यायाने उन्मत्तही झाला. त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून सर्व देव कैलासावर तप करत असलेल्या शिवाला शरण गेले आणि या दैत्यापासून मुक्ती देण्याची श्रीशंकराला विनंती करू लागले. याच वेळेस देवांच्या पाठोपाठ अंधकही तिथे धडकला. पार्वतीला पाहून तो मोहित झाला आणि त्याने तिलाच पळवायचा प्रयत्न केला. त्याचे हे धारिष्ट्य पाहून शिवाला क्रोध आता त्याने वासुकी नागाचा कंबरपट्टा केला, तक्षक आणि धनंजय या दोन नागांची क़कणे धारण केली आहे. तो तात्काळ त्याच्याशी युद्ध करायला सज्ज झाला. अंधकासुर शिवाकडे गेल्याचे कळताच नील नावाव एक असुर हत्तीचे रूप घेऊन तिथे आला. त्यालाही शिवाला मारायचे होते. परंतु नंदीने त्याला ओळखले आणि चीरभद्राला हे सांगितले. वीरभद्रने सिंहाचे रूप घेतले आणि तो नीलासुरावर चालून गेला. त्याने हत्तीच्या रूपातील नीलासुराला तर मारलेच परंतु त्याचे चामडे सोलून काढून शिवाला आणून दिले. शिवाने उत्तरीय म्हणून ते धारण केले आणि त्रिशूल सरसावून आपल्या गणांच्या सैन्यासह अंधकासुराशी लढायला निघाला. विष्णू आदी देवांनी त्याला साहाय्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या रणकंदनातून त्यांनाही पळ काढावा लागला. भयंकर संग्रामानंतर शिवाने आपले धनुष्य काढले आणि बाण मारून अंधकासुराला घायाळ केले. त्याच्या झालेल्या जखमांमधून प्रचंड रक्तस्रावामुळे आणि जमीनीवर पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून एक नवीन अंधकासुर तयार होऊ लागला. शिवाने मुळचे अंधकासुराला मग त्रिशूळाने भोसकून मारले आणि दूर अंतराळात भिरकावून दिले. अधकासुराच्या अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या रक्तांच्या थेंबांना झेलण्यासाठी शिवाने आपल्या मुखातून अग्नि ज्वाळा काढल्या आणि त्यातून योगेश्वरी नावाची शक्ती उत्पन्न केली. तिच्या मदतीला इंद्र आणि अन्य देवांनी आपापल्या शक्ती पाठवल्या. सात देवांच्या सात शक्ती अशा या सप्तमातृका उत्पन्न झाल्या आणि त्यांनी त्या असुराच्या नाशासाठी शिवाला साहाय्य केले. (मणीः १९९५, पृ. १९).
  या मातृकांची नावे माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, वाराही आणि चामुंडा अशी असतात, ज्या क्रमशः महेश्वर, विष्णू, ब्रह्मा, कुमार (कार्तिकेय), इंद्र, वराह (विष्णूचा अवतार) आणि यम या देवांच्या शक्ती होत.
  गुप्तपूर्व कुषाण काळात (इ.स. १-२ रे शतक) सप्तमातृकांचे शिल्प आढळते. यामध्ये त्यांची वाहने किंवा आयुधे दिसत नाहीत तसेच त्यांच्याबरोबर शिव किंवा स्कदाचे शिल्पांकन दिसते.
     गुप्त काळामध्ये मात्र यांचे प्रमाणिकीकरण झालेले दिसते, जे पुढे समान पद्धतीने चाललेले आढळते. यांच्या शिल्पपटामध्ये डावीकडून पाहताना पहिला वीणाधर शिव त्यानंतर ब्राह्मी किंवा ब्रम्हाणी त्यानंतर माहेश्वरी, वैष्णवी, कौमारी, ऐन्द्री, वाराही, चामुंडा आणि शेजारी गणपती असे दिसते. शिवाय माहेन्द्री, नारसिंही, गणेशी किंवा वैनायकी, नारायणी, अंबिका, भद्रकाली, योगेश्वरी, काली, शिवदुती, वरुणी इत्यादींचेही शिल्पांकन आढळते. या मातृकांखाली त्यांची वाहनेही दिसतात, जी अनुक्रमे हंस, वृष, गरुड, मोर, गज, वराह आणि प्रेत असतात. सप्तमातृकांची संख्या सुरुवातीला सात आणि काही ठिकाणी आठ अशी होती. पुढे ती सोळा, बत्तीस, चौसष्ट अशी झाली. गुतकाळातील  सप्तमातृकांचे शिल्पांकन उदयगिरी (म.प्र.) येथे दिसते. परंतु ओळखण्यापलीकडे त्याची अवस्था गेली आहे. 
      वेरुळमध्ये रावण की खाई (लेणे क्र. १४), यज्ञशाळा (क्र. १६) आणि रामेश्वर (क्र. २१) येथे यांचे सुरेख शिल्यांकनआहे. लेणी क्र. १४ तील शिल्पांकन अंधाऱ्या जागेत असल्यामुळे ते सहज दिसत नाही. कैलास मंदिरातील यज्ञशालेमध्ये असलेल्या शिल्पांकनात बहुतेक मातृकांची मस्तके तोडण्यात आली असून तेथे मातृकांबरोबरच माणिकावती राणीचेही शिल्पांकन केलेले दिसते. या राणीच्या हट्टामुळे  (कैलास) मंदिराची निर्मिती झाली असे म्हणतात. याच शिल्पपटातील काली ही कालाला टेकून बसली असून दोन प्रेतांवर आरूढ असलेल्या कालाचे शिल्पांकन आहे.
 चित्र क्र. १०४ : काल आणि काली, यज्ञशाला,    कैलास मंदिर, वेरूळ

      कालाच्याखालील मानवी शरीरे ही प्रेतेच आहेत आणि डोळे बंद करून झोपलेली माणसे नाहीत हे दाखविण्यासाठी कलाकाराने त्याचे कसब पणाला लावलेले दिसते. त्याने या दोन्ही देहांचे डोळे मिटलेले दाखवले असून त्यांना पूर्ण नम्न कोरले आहे आणि एवढेच नाही तर त्यातील एका प्रेताच्या मांडीचा लचका तोडताना एका लांडग्याचे तोंडही अत्यंत कल्पकतेने कोरलेले आहे. रामेश्वर लेणे (क्र. २१) मधील नटराजाच्या शिल्पाशेजारी गणपती आणि वीरभद्र यामध्ये बसलेल्या सप्तमातृका कोरल्या आहेत. डावीकडून अनुक्रमे ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णचं, चाराही, इंद्राणी आणि चामुंडा या असून प्रत्येकीच्या मांडीवर एक मूल आहे. एका मातेने (वाराहीने) मात्र त्याला खाली उतरवले आहे. चकित झालेले मूल आईकडे पाहते आहे. आई मात्र सुटकेच्चा निःश्वासाने केस सावरते आहे. तिने मानेला दिलेला झटका कलाकाराने हुबेहूब कोरला आहे. असामान्य कला प्रतिभेचे ते द्योतक आहे. तिच्या डोळ्यातील तिला असणारी सौंदर्याची मग्रुरी काळीज छेदणारी आहे. या सवं मातृका अत्यंत सुडौल आणि सौष्ठवपूर्ण कोरल्या आहेत
    ऐहोळे (कर्नाटक) येथील रावण पहाडी या मंदिरात आणि महाबलीपुरम् (तामिळनाडू) येथील लेणी मंदिशा या मातृका उभ्या असलेल्या कोरल्या आहेत. यातील बाराही या मातृकेला चक्क वराहाचेच तोंड असल्याचे दाखविले आहे.प्रत्येकीची केशरचना, दागिने व वस्त्रं वेगवेगळी आहेत.
चित्र क्र. १०५ : बाराही, रामेश्वर लेणे, वेरूळ

चौसष्ट योगिनी :-

     अग्नि पुराणात यांचा 'आकाश मातृका' असा उद्देश येतो, ज्यामध्ये या केवळ सही रूप घेऊनच नाही तर पशुपक्षी किंवा कीटकांच्या रूपानेही त्या सर्वत्र संचार करतात. काही मातृका या रौद्र असतात, तर काही सौम्य असतात. यांची उपासना तांत्रिक पंथांतर्गत येते, ज्याचा हेतू शत्रूवर विजय, अस्मानी संकटापासून रक्षण, पुत्रप्राप्ती तसेच अष्टसिद्धी प्राप्त करण्यासाठी असतो. हीरापूरच्या (ओडिशा) मंदिरात आजही जारण मारण, करणी करणे यासारखे विधी सुरू असतात.
       चौसष्ट योगिनींची नावे - १. बहुरूपा २. तारा ३. नर्मदा ४. यमुना ५. शांती ६. वारुणी ७. क्षेमकारी ८. ऐन्द्री ९. वाराही १०. रणवीरा ११. वानरमुखी १२. वैष्णवी १३. कालरात्री १४. वैद्यरूपा १५. चर्चिका १६. बेताली १७. छिन्नमस्तिका १८. वृषभवाहना १९. ज्वालाकामिनी २०. घटवरा २१. करकाली २२. सरस्वती २३. विरूपा २४. कावेरी २५. भालुका २६. नारसिंही २७. विराजा २८. विकटन्ना २९. महालक्ष्मी ३०. कौमारी ३१. महामाया ३२. रती ३३. करकरी ३४. सर्पाश्या ३५. यक्षिणी ३६. विनायकी ३७. विद्यबालिनी ३८. वीराकुमारी माहेश्वरी ४०. अंबिका ४१. कामायनी १२. पातवारी ४३. स्तुती ४४. काली ४५. उमा १६. नारायणी ४७. समुद्रा ४८. ब्रह्माणी १. ज्वालामुखी ५०. आग्नेयी ५१. अदिती १२. चंद्रकांती ५३. वायुवेगा ५४. चामुंडा * मुराति ५६. गंगा ५७. धूमावती ५८. गांधारी ११. सर्वमंगला ६०. अजिता ६१. सूर्यपुत्री १२. वायुवीणा ६३. अघोरा ६४. भद्रकाली. नवंतराय: २००८,५.४९-११३).
चित्र क्र. १०६ : वाराही, चौसष्ठ योगिनी मंदिर, हीरापुर
चित्र क्र. १०७ : योगिनी, रानी की वाव, पाटण
 
बौसष्ट योगिनींची शिल्पे ही चौसष्ट योगिनींच्या मंदीरात आढळतात. ही मंदिरे भारतामध्ये संख्येने थोडी असून सर्व मूर्ती जागेवर आणि उत्तम स्थितीत असणारे ओडीशामधील हीरापूर येथील एकमेव मंदिर आहे. याशिवाय रीखीया आणि लोखारी (बांदा जिल्हा), दूधही (दलीपूर, उत्तर प्रदेश), ग्वाल्हेर जवळ मिताली आणि नरेसार, जबलपूरजवळ भेडाघार, शाहडोलजवळ त्रिपुरी, रीबाजवळ गुर्गी आणि खजुराहो (सर्व मध्य प्रदेश) येथे ही मंदिरे आहेत.
      याशिवाय योगिनींची स्वतंत्र शिल्पे अनेक मंदिरांमध्ये आढळतात. तपस्विनींच्या रूपामध्ये या कोरलेल्या असतात आणि त्यांच्या हातामध्ये खटवांग नावाचे आयुध असते. एका छोट्या काठीवर मानवी कवटी असे हे आयुध असते. योगिनीप्रमाणेच अनेक मंदिरांमध्ये विषकन्यांचीही शिल्पे दिसतात या मूर्तीमध्ये मांडी भोवती, कमरेभोवती, दंडाभोवती किंवा गळ्याभोवती नाग गुंडाळलेले असतात. तसेच एका किंवा दोन्ही हातात सर्प धरलेली किंवा सर्पाशी खेळणाऱ्या स्त्रीमूर्तीची शिल्प असतात. बहुतांशी शिल्पांमध्ये या विषकन्या पूर्णपणे विवस्त्र दाखविलेल्या असतात. धर्मापुरी (जिल्हा बौड) येथील ११ व्या शतकातील मंदिरात केवळ अलंकारणाने वस्त्रांकन असणाऱ्या विषकन्येचे अत्यंत सुरेख शिल्प आहे. खिद्रापूर (जिल्हा कोल्हापूर) येथल्या कोपेश्वर मंदिरात विषकन्यांबरोबरच भैरवीचेही शिल्प दिसते. येथील एक विषकन्या देहुड्या पाउली उभी असून दोन्ही हात तिने डोक्यावर घेतले असून गळ्यातल्या माळा एवढेच तिचे वस्त्र असून तिच्या मांडीला नागाने विळखा घातला आहे. खिद्रापूर येथील विषकन्यांच्या शिल्पांमध्ये एक किंवा अधिक नागांचा अंगाभोवती विळखा असलेल्या नग्न युवतींचे शिल्पांकन दिसते.

नागकन्यांची उल्लेखनीय शिल्पे

पानगाव (जिल्हा लातूर) :-
   येथील विठ्ठल मंदिरात (इ.स. ११वे शतक) एका नागकन्येने तिच्या उजव्या हातामध्ये एका प्रचंड नागाला अलगद पकडलेले आहे, तिचा डाव हात डोक्यावरती असून त्यावर एक मुंगुस बसले आहे. मुंगुस आणि साप हे परस्परांचे जन्मजात शत्रू. त्या दोघांनाही तिने एकाच वेळेस लीलया ताब्यात ठेवले आहे. तो मुंगुस अशा पद्धतीने दबा धरून बसलेला आहे की कधी तिचे लक्ष उडते आणि तो सापावर झेपावतो. तर तो नाग तिच्या दोन बोटांच्या चिमटीतून सुटण्यासाठी तोंड उघडून सळसळतो आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या नजरेतून स्पष्ट दिसतो आहे.

चित्र क्र. १०८ : नागकन्या विठ्ठल मंदिर, पानगाव

 नागकन्यांच्या मालिकेतील सर्वोत्तम शिल्प हे राणी की बाव, पाटण येथे आहे. पूर्णाकृती असलेल्या ह्या शिल्पामध्ये तिच्या दंडावर आणि मनगटावर रुद्राक्षाच्या दोन बांगड्या आणि गळ्यात रुद्राक्षांचीच एक कंठी एवढेच तिच्या अंगावर आहेत. तिच्या उजव्या हातात एक वाटी असून त्यात एक मासा आहे, ज्याचे प्रलोभन ती एका महाभयंकर सर्पाला देते आहे. ज्याचे तोंड त्या वाटीजवळ असून त्या सपनि तिच्या मागून त्याच्या शेपटीचे वेटोळे तिच्या डाव्या मांडी भोवती गुंडाळलेले आहे. तिचा डावा हात तिने त्याच्यावर उगारलेला आहे. तिच्या पायामध्ये एक मोर आहे. इथेही या दोन जन्मजात शत्रूना लीलया नियंत्रणात ठेवणाऱ्या या विषकन्येचे हे अप्रतिम असे शिल्पांकन आहे. तिच्या ओटीपोटावर दोन आडव्या वळ्या आहेत, ती कुमारिका नसल्याचे ते लक्षण आहे. तिच्या डोक्यावर अशुभदर्शक तीन घुबडे कोरलेली आहेत. शरीर शास्त्राच्या दृष्टीने आणि तिच्या हालचालींना पोषक असे शरीराच्या अंगोपांगाचे बारकावे थक्क करणारे आहेत. या उन्मुक्त आणि अनावृत अशा रूपाच्या प्रथमदर्शी मोहात जरी कोणी पडले तरी त्याने ती एक विषकन्या आहे याचे स्मरण ठेवावे.
चित्र क्र. १०९ : नागकन्या, रानी की वाव, पाटण

 *शक्ती रुपे*

भारतात अगदी प्राचीन काळापासून शक्तीवादाचा प्रचार झालेला दिसतो .सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून आपल्या देशात मातृपूजा प्रचलीत होती .सिंधू संस्कृतीच्या उत्खलनात मातृदेवतांच्या मुर्ति आढळलेल्या आहेत .भूमध्यसागराच्या अनेक भागात मातृपूजा प्रचलित होती .आर्यानी सुद्धा मातृपूजनाचा स्वीकार केलेला दिसतो .शैव ,वैष्णव संप्रदायासारखांच देवींचा शक्ती संप्रदाय झालेला दिसतो .हा संप्रदाय शक्तीसंप्रदाय समजला जातो .या संप्रदायात दुर्गा ही प्रधान देवी मानली जाते .देवींची अनेक नावे व स्वरूपे विविध प्राचीन ग्रंथात दिलेली आहे .दुर्गाचे मुख्य तीन स्वरुपे मानली गेली आहेत  ती म्हणजे महालक्ष्मी,महाकाली व महासरस्वती ही रज ,तमस व सात्वीक ही गुण मानली जातात .ब्रम्हा,विष्णू,शिव यांच्या परमतेजाच्या पुर्नरावर्तीत शक्ती आहेत असे वेदांत मान्यता आहे .वेदानंतर पुढे आरण्यके व उपनिषदे विकसित झाली .

     देवी उपासनेचे मंत्रशास्त्र हे स्वतंत्र सूत्र रचले गेले .भारतात तर प्राचीन काळापासूनच शक्तीवादाचा प्रचार झाला .सिंधू संस्कृतीमधील अवशेषावरून हे सिद्ध होते.या संस्कृतीत लिंग पूजा,पशुपतीपूजा,देवीपूजा व वनस्पती पूजा होत असे .मातृदेवतेच्या मुर्ति देखील मिळाल्या आहेत .भारता बाहेरही 'नुझी ' या इरान इराक सिमेवर असलेल्या ठिकाणी बैलाची व स्त्रीची आकृती उत्खलनात मिळाली आहे यावरून येथे इं.स़नापूर्वी शेकडो वर्षा अगोदर मातृपूजा प्रचलित होती .पश्चीम महाराष्ट्रातील 'इनामगाव 'येथे झालेल्या उत्खलनात अशाच प्रकारची बैल व स्त्री अशी स्वतंत्र मूर्ति एका मातीच्या  लंब चौकोणाकार पाटीवर आढळली आहे ही एक प्रकारची मातृपूजा प्रचलित होती .महाराष्ट्रात सातवाहन काळापासून वाकाटक,राष्ट्रकुट,गुप्त काळातील अनेक शिल्प निर्माण झाले .यामधे देवी देवतांची अनेक शिल्पे आहेत .

    रूपमंऽनोक्त आणि अपराजित सूत्रात खालिल नवदुर्गाचे स्वरूप सांगितले आहेत .

१)महालक्ष्मी

सहा भूजा असलेली वरद,त्रिशूल,ढाल,पानपात्र,नाग धारण केलेला आहे .

२)नंदा

ही चारभूजा धारी यक्षसूत्र,खडग,ढाल,पानपात्र धारी आहे.

३)क्षेमकरी

चार भूजा असलेली वरद, त्रिशूल, कमल, पानपात्र धारण केलेली आहे.

४) शिवदुती

ही चार भुजाधारी कमंडल, चक्र,ढाल पानपात्र घेवून आहे .

५)महाचंडी

ही खडग,त्रिशूल,घंटा,ढाल चार भूजाधारी आहे .

६)भ्रामरी

ही सुध्दा चार भूजाधारी खडग,डमरू,ढाल,पानपात्र धारी आहे.

७)सर्वमंगला

चार भूजा धारीणी माला,वज्र,घंटा,पानपात्र घेवून आहे .

८)रेवती

दंड,त्रिशूल,खडवांग,पानपात्र धारिणी देवी आहे .

९) हरिरिध्द

ही चार भूजा असलेली कमंडल,खडग ,डमरु व पानपात्र धारीणी आहे.

अशी नऊ नवदुर्गास्वरुप यामधे सांगितली आहे .

सप्तशती या ग्रंथा मधे नवदुर्गाची रूपे खालील प्रमाणे  एका श्लोकामधे सांगितली आहे .

प्रथमं शैलपुत्रीति द्वितिय ब्रम्हाचरणी ।

तृतीय चंद्रघंण्टेति,कुष्मण्डेती चर्तुर्थकम् ॥

पंचमं स्कधंमातिति,षष्ठं काव्यायनिति च ।

साप्तमं कालरात्रिती,महागौरिति चाष्टमम् ॥

नवम् सिध्दीदात्री च नवदुर्गा प्रर्कितिताः ।

उक्तान्येतानि नामानि ,ब्रम्हानैव महात्मनाः ॥

वृषभवाहन असलेली 'शैलपुत्री'

माला ,कमंडल धारण केलेली द्वि भूजा असलेली 'ब्रम्हाचरिनी'

व्याघ्र वाहन असलेली 'चंद्रघंटा'

व्याघ्र वाहन असलेली सहा भूजा असलेली धनुष्य,चक्रगदा,त्रिशूल आदी शस्त्र हाती असलेली 'कूष्मांडा'

सिंह वाहन असलेली चार भूजा धारी 'स्कंधमाता'

सिह वाहन असलेली चार भूजा धारी 'कात्यायनी'

गर्दभ वाहन असलेली अभय,खडग,त्रिशूल व पाश धारिणि 'कालरात्री '

नंदी वाहन असलेली 'महागौरी '

कमल वाहन असलेली चार भूजा धारी गदा,चक्र,पुस्तक ,कमलधारिणी 'सिद्धीदायी'

ही नव स्वरूपे या प्राचीन ग्रंथात येतात . याशिवाय स्त्री शक्तीची रूपे असलेल्या सप्त मातृका सुद्धा आपल्या परिसरात आपल्याला आढळतात त्यापैकीच ब्राम्हणी,माहेश्वरी,कौमारी,वैष्णवी,वाराही,इंद्राणी,रक्तचामुंडा

ह्या सप्तमातृका सुद्धा प्राचीन काळापासून पूजल्या जातात .या सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे देखील आहेत .वेरुळ लेण्यामध्ये या सप्तमातृकाचा पट आहे.यांच्या काखेत किंवा मांडिवर बालक सुद्धा बसलेले आढळतात . पाण्याचे स्त्रोत ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी या सप्तमातृकाचे वास्तव्य आपल्याला दिसते.

भद्रकाली,महाकाली,चंडी,चामुंडा,रक्तचामुंडा ,महीषासूर मर्दिनी, लक्ष्मी महालक्ष्मी, महा सरस्वती ,श्रीदेवी सरस्वती, अंबा ,अंबिका भुवनेश्वरी ,अन्नपूर्णा गायत्री, गंगा, यमुना शितला, तुलसी, दुर्गा अशी अनेक देवीची म्हणजेच शक्तीचे रूपे आहेत ह्या शक्ती किंवा ही रूपे ओळखण्यासाठी त्यांच्या बहुकरांमध्ये असलेली शस्त्र त्यांनी धारण केलेले वाहन यावरून आपणास ती ओळखता येतात. या स्त्री शक्तींचा जागर अनंत काळापासून आपल्या पवित्र भूमीत होत आलेला आहे.

संदर्भ -भारतीय शिल्पसंहिता ,प्र ओ सोमपुरा तथा मंदिर लेणी भ्रमंती व शिल्प अभ्यासातून

https://shivjagars.blogspot.com/2023/10/blog-post_25.html


११. कार्तिकेय

चित्र क्र. ११० : कार्तिकेय, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली

    कार्तिकेयाच्या प्रतिमा कुषाण, गुप्त आणि यौधेयांच्या नाण्यांवर आढळतात. वेद काळात त्याचे कुमार हे नाव असावे आणि पुढे स्कंद या नावाने तो प्रचलित झाला. सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र, स्कंदामह अशी त्याची नावे होती. तर त्यांच्या प्रतिमांची नावे देवसेनापती, गांगेय, शिवसुत, षडानन इ. होती. प्राचीन काळापासून स्कंद पूजा सुरू होती. दक्षिण भारतात षण्मुगम किंवा सुब्रह्मण्यम् या नावाने याची पूजा होते. प्राचीन वाङ्‌मयामध्ये सनत्कुमार हाच स्कंद होता. तो महेश्वराचा मुलगा होता, तो विभावसू अग्नीचा पुत्र होता असे उल्लेख येतात. तर पुराण काळात तो शिव पार्वतीचा पुत्र होता. शिव पुराणाच्या अठराव्या अध्यायात त्याच्या जन्माची कथा येते. तारक नावाच्या असुराने ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाल्यामुळे ब्रह्मांडात उच्छाद मांडायला सुरुवात केली. देवांची सेना त्याचा प्रतिकार करण्यात कमी पडू लागली. त्यांना एका सक्षम सेनापतीची गरज होती ब्रह्मदेवाने देवांना सांगितले की शिव पार्वतीचाच पुत्र सेनापती झाल्यास तो तारकासुराचा वध करेत. भगवान शंकर महायोगी आणि ब्रह्मचर्येचे व्रत घेतलेले, त्यामुळे त्यांची आधी मनधरणी करून त्यांना लग्नाला तयार केले. इकडे पार्वतीने पंचाग्नी तप आरंभले होते ते त्यासाठीच. अखेर त्या दोघांचा विवाह झाला परंतु पंधरा वर्षे ते कामक्रीडेतच मप्न राहिले. पृथ्वीला हा भार असह्य झाल्यामुळे सर्व देवांसा इंद्राने कैलासावर जाऊन त्यांची याचना केली. या दरम्यान वार्यावर उडून त्याचे काही वीर्याचे गंगेत पडले. तेथे सहा कृत्तिका स्नान करत होत्या आणि त्या सहा कृत्तिकांच्या गर्भातून याचा जन्म झाला. म्हणून त्याचे नाव 'कार्तिकेय' असे झाले. हे सहा डोकी असणारे मूल जन्माला आले म्हणून त्याला षडानन किवा षण्मुगम असे म्हणतात. पुढे हा पराक्रमी मुलगा देवसेनेचा सेनापती झाला आणि त्याने भीषण झालेल्या रणकंदनामध्ये तारकासुराचा वध केला. गुप्तकालापासून दिसणाऱ्या शिल्पांमध्ये कार्तिकेयाचे वाहन मोर असून त्याच्या हातात त्रिशूळ, पाश, सर्प, आदी आयुधे दिसतात. (जोशी : १९७९).     
        कार्तिकेयाच्या काही शिल्पांमध्ये त्याच्या हातात कोंबडा धरलेला असतो. याचे कारण असे की कोंबडा हे कामवासनेचे प्रतिक मानले जाते. ब्रह्मपुराणामध्ये या युद्धानंतर विजयी झाल्यावर कार्तिकेयाने देवाच्या बायकांवरही अत्याचार करावयास सुरुवात केली. शेवटी पार्वतीने एक युक्ती केली, कार्तिकेयाने कुठल्याही स्त्रीला धरण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिथे पार्वतीचेच रूप दिसेल. त्यानंतर कार्तिकेयाने सर्व स्त्रियांना, माता समजून पाहण्याची प्रतिज्ञाच करून टाकली. कार्तिकेयाच्या अशा चारित्र्यामुळे महाराष्ट्रात आजही कार्तिकेयाच्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो.
   वेरुळमध्ये रामेश्वर लेणे क्र. २१ मध्ये कार्तिकेयाचे मोठे शिल्प आहे. त्याच्या शेजारी मेषाची तोंडे असणारे दोन सेवक असून त्यांची नावे नैगमेष आणि छग्वत्र अशी असतात. कार्तिकेयाच्या पायाजवळ एक मोठा मोर काढलेला असून त्याच्या डाव्या हातात त्याने कोंबडा धरलेला आहे. कोंबड्याचे आणि मोराचे मुख तुटलेले आहे.
चित्र क्र. १११ : कार्तिकेय, रामेश्वर लेणे, वेरूळ

     दक्षिण भारतातील काही शिल्पांमध्ये मोरावर पत्नीसह बसलेला कार्तिकेय दिसतो. त्याला 'सेनापती' असे म्हणतात. याचे कारण देवसेना ही त्याची शक्ती होती जिला स्त्री रुपात दाखवले जाते.
 कर्नाटकात ऐहोळे येथील शिल्पात (इ.स. ८ कार्तिकेय हातात तलवार आणि शक्ती घेऊन तारकासुराशी युद्ध करीत असल्याचे शिल्प आहे. वारंगळ ( आंध प्रदेश) येथील रामप्पा मंदिरात (इ.स.१३ वे शतक) सहा डोक्याचा कार्तिकेय तारकासुराशी युध्द करताना दाखवला आहे. दक्षिण भारतात या देवाची लोकप्रियता गणपती इतकी किंवा त्याहून अधिकच असावी असे वाटते. 

१२. गणपती

 
चित्र क्र. ११२ : नृत्यगणेश, खजुराहो

सर्व विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना ज्याचे स्मरण मांगल्याची देवता म्हणून आज आसेतुहिमाचल केले जाते असा हा आधुनिक सर्वाधिक लोकप्रिय देव आहे. प्राचीन काळात जेव्हा इंद्र, ब्रह्मा, शंकर, विष्णू किंवा कार्तिकेय या देवतांची पूजा हात होती तेव्हा त्यात गणपती कुठेही नव्हता. वेद, स्मृती, पुराणे, रामायण, महाभारत इतकेच काय प्राचीन शिलालेखातही याचा उल्लेख आढळत नाही.
   याच्या जन्माच्या अनेक कथा आहेत. (जोशी: १९७९)
१. पार्वतीच्या अंगातून आलेल्या मळातून त्याचा जन्म झाला आणि तिने त्याला दारावर उभे केले. त्याने शंकराला अडविल्यावर शंकराने त्याचे मुंडके उडवले. मग पार्वतीने तो आपला मुलगा आहे सांगितल्यावर शंकराने त्याला हत्तीचे डोके आणून बसविले.
२. पार्वतीला मुलगा झाला तेव्हा त्याला देव पाहायला आले. शनीने पाहाताच त्या मुलाचे मुंडके गळून पडले. एकच हाहाकार झाला तेव्हा शंकराने हत्तीचे डोके त्याला लावले.
  ३. पृथ्वीवर पाप वाढल्यामुळे देव चिंतीत झाले व ते रुद्राकडे गेले. रुद्राने पार्वतीकडे पाहिले आणि  प्रकाशतत्त्वाचा प्रतिनिधी एक पुरुष प्रकटला. पार्वती त्याचे सौंदर्य न्याहाळू लागली त्यावर चिडून शंकराने त्याला शाप दिला की तुला हत्तीचे तोंड असेल, तू सापाचे जानवे घालशील आणि तुझा देह मोठा होऊन पोट सुटलेले असेल. याच वेळेस अनेक विनायकांची निर्मिती झाली आणि ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून आणि शंकराच्या कृपेने गजानन हा सर्व विनायकांचा अधिपती झाला.
 ४. शिवपार्वती विहार करण्यासाठी पर्वतावर गेले. तेथे गज दाम्पत्याची क्रीडा पाहून त्या दोघांनीही तशीच रूपे घेतली. त्या प्रसंगाचे फल म्हणजे गणपतीची उत्पत्ती होय.
 ५. स्कंद पुराणामध्ये आणखीन एक कथा मिळते. सिंदुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्याकरता विष्णूने पार्वतीच्या पोटी अवतार घेण्याचे ठरविले. सिंदुरासुराला ही गोष्ट कळली त्याने पार्वतीच्या गर्भात प्रवेश करून मुलाचे डोके कापले व नर्मदेत फेकून दिले. मस्तकहीन परंतु जिवंत मूल जन्माला आले. शंकराने एका हत्तीला मारून त्याचे मुंडके त्याला बसवले. या गजाननाने पुढे त्या सिंदुरासुराचा वध केला.
  मूर्तिरूपात पूजल्या जाणाऱ्या देवांसाठी अनेक कथा निर्माण झाल्याचे दिसते. पूजनीयता प्राप्त करण्यासाठी देवांनाही पराक्रम करायला भाग पाडले जाते. मूर्ती घडवण्यासाठी प्रचलित झालेल्या कथांमधून विशिष्ट देवतांना लोकप्रिय करण्याचेही प्रयत्न झाल्याचे जाणवतात. तसेच मूर्तीच्या निर्मितीचे प्रयोजन आणि त्याचे समर्थनही करावे लागते असे दिसून येते.

शिल्परूपात गणपती :-

   बौद्ध शिल्पांमध्ये ठेंगण्या आणि तुंदिलतनू अशा यक्षांच्या मूर्ती दिसतात. यातील काही मूर्तीना प्राण्यांचीही तोंडे लावलेली असतात. वेरुळमध्ये विश्वकर्मा लेणे (क्र. १०) या सहाव्या शतकातील बौद्ध लेण्यामध्ये अशा गणाचे शिल्प दिसते. या लेणीतील प्रवेशद्वारा आतल्या बाजूला एका रांगेत नाचणारे गण कोरले आहेत. त्यामध्ये एक गजमुख गण आहे. गुप्त काळाच्या सुमारास गणपतीचे शिल्पांकन झालेले दिसते. सुरुवातीच्या काळातील शिल्पांमध्ये अलंकार नसलेले मुख आणि सर्पाचे यज्ञोपवीत दिसते. दोन किंवा चार हातांच्या मूर्ती त्या काळात होत्या. नंतरच्या काळात मात्र अनेक हात, अनेक तोडे अनेक सोंड अशी त्याची शिल्पे आढळतात.

चित्र क्र. ११३ : उच्छिष्ठ गणेश, देलमाल, गुजरात

    गणपतीची स्वतंत्र मंदिरे मात्र प्राचीन काळात नव्हती, पंचायतन पद्धतीच्या मंदिरांमध्ये गणपतीची मंदिरे दिसतात. पंचायतन मंदिरे म्हणजे मुख्य मंदिर मध्यभागी आणि त्याभोवती बाकी देवतांची चार उपमंदिरे त्याभोवती अशा स्थापत्यामध्ये मध्यभागी शंकर, विष्णू, देवी किंवा सूर्याचे मंदिर असावयाचे. परंतु गणपती मात्र उपमंदिरातच स्थापन केलेला असावयाचा. साधारणतः गणपतीच्या हातामध्ये पाश, अंकुश, परशु, मोदक वगैरे दिसतात व त्याचे वाहन उंदीर असते. ऋिद्धी व बुद्धी किंवा सिद्धी या त्याच्या दोन बायका, काही शिल्पांमध्ये एक किंवा दोन्ही बायका दिसतात. मांडीवर बसलेल्या स्त्रीच्या हनुवटीला, स्तनांना आणि मांडीला सोंडेने स्पर्श करतानाचे गणपतीचे शिल्प असल्यास त्याला उच्छिष्ठ गणेश असे म्हणतात. नृत्य गणेश किंवा तांडव करणाऱ्या गणपतीची शिल्पेही अनेक ठिकाणी आढळतात. परंतु खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरामध्ये गणपतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे.
    महाभारताचे लेखन करण्यासाठी गणपती आपला लेखनिक व्हावा, अशी मागणी महर्षी व्यासांनी केली. गणपतीने हे कार्य एका अटीवर करण्याचे मान्य केले. ती अट अशी की व्यासांनी त्यांची काव्य रचना करीत असतानाच त्यांनी ती सांगायची आणि गणपतीने ती लिहून घ्यायची, परंतु हे करत असताना व्यासांनी कुठेही अडखळायचे किंवा थांबावयाचे नाही. महाकाव्याची रचना करण्याचे ते काम होते. ते पाठ केलेल्या कवितेप्रमाणे कोणीही सांगणे हे शक्य नव्हते. परंतु व्यासच ते, गुरुचे गुरू, त्यांनी ही अट मान्य करताना गणपतीलाही एक अट घातली की प्रत्येक लोकाचा अर्थ समजूनच त्याने तो लिहावा. याला गणपती तयार झाला. महर्षी व्यास हे काही सामान्य कवी नव्हते. त्यांनी महाभारताची रचना करताना मध्ये मध्ये काही कुट श्लोकांचीही रचना केली. कूट श्लोक महणजे कोडी. ती कोडी इतकी क्लिष्ट असायची की अनेकदा त्याचा अर्थ समजून घ्यायलासुद्धा गणपतीला काही काळ विचार करायला लागायचा. त्या काळामध्ये महर्षी व्यास पुढील काव्याची रचना करून ठेवायचे. असे म्हणतात की ना कधी व्यास अडखळले, ना गणपतीची लेखणी थांबली. (महाभारत, आदिपर्व, अनुक्रमणी पर्व, अ. २)

चित्र क्र. ११४ : गणपती, लक्ष्मण मंदिर, खजुराहो
 
    महाभारतातील तो प्रसंग खजुराहो- मधील लक्ष्मण मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवरील देवकोष्ठात गणपतीच्या शिल्पात साकारला आहे. या शिल्पातील गणपती नृत्यमृद्रेत असून हातातील लेखणीने मांडवरच्या वस्त्रावर लिहिण्याचा जणू अभिनय करतो आहे असे वाटते. कानावर पडलेला प्रत्येक शब्द समजून लिहिताना होणारी एकाग्रता त्यांच्या मुखावरील भाव स्पष्ट दर्शवितात. महाभारतातील तो प्रसंग सूचकतेने साकारण्याचा प्रयत्न कलाकाराने केला असावा असे वाटून जाते.
चित्र क्र. ११५ : नृत्यगणेश, खजुराहो

परिवर्तन हाच जगताचा नियम आहे. हे मानणाऱ्या हिंदू धर्मात देवांच्याही लोकप्रियतेत बदल घडत जातात, हे या धर्माचे मोठे आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी फारसा लोकप्रिय नसलेला गणपती हा पेशव्यांच्या काळापासून सर्वाधिक लोकप्रिय देव झाला. १९ व्या शतकात लोकमान्य टिळकांनी त्याचा सार्वजनिक उत्सव सुरू केल्यामुळे त्यात भरच पडली. तर गेल्या शतकात संतोषी मातासारखी दैवतेही अत्यंत लोकप्रिय झाली होती. तसेच काही संतपुरुषांनाही आज देवत्व प्राप्त झाल्याचे दिसते.

१३. सूर्य

 
बित्र क्र. ११६ : सूर्य, राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली
 
वेद काळामध्ये ज्या निसर्ग देवतांची पूजा होत असे त्यातील सूर्य ही एक प्रमुख देवता. पृथ्वीवरच्या आपल्या अस्तित्वाला कारणीभूत असणारी प्रभावी आणि जीवनदायी शक्ती हीच असल्याचे त्या काळातच उमगले होते. त्यामुळे सूर्याची अत्यंत कृतज्ञतापूर्वक पूजा केली जात असे. आजही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक अशी आपली जगभर ओळख आहे. दूर डोंगरात खेड्यापाड्यात राहणाऱ्यांपासून शहरात राहणाऱ्यांपर्यंत सगळेच सकाळी सकाळी सूर्यनारायणाला हात जोडताना दिसतात. असे असले तरी मूर्तिरूपामध्ये सूर्याची उपासना आपल्याकडे रूढ नव्हती. प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीमध्ये सूर्याला देव म्हणून ते पूजत असत. त्यांच्या देवळांमध्ये त्या काळी वहाणे काढून जायची पद्धत नव्हती. (आजही चर्चमध्ये जाताना पादत्राणे काढत नाहीत) त्यामुळे त्यांच्या देवांच्या मूर्तीही विविध शस्त्रधारी आणि पादत्राणांसहित असत. इराणमध्ये अग्नीची उपासना करणारा एक पंथ प्रबळ होता. ज्याचे वंशज म्हणजे आजचा पारशी समाज, परंतु अग्नीचे उपासक आणि सूर्याचे उपासक यांच्यात तंटा झाल्यामुळे सूर्योपासकांना (ज्यांना 'मग' म्हणत) भारताचा आश्रय घ्यावा लागला. या मगानी आपले देवही आपल्याबरोबर आणले. आपल्या समाजात त्यांना सामावून घेण्यासाठी त्यांना मागी ब्राह्मण म्हणून स्थान तर दिलेच परंतु त्यांच्या देवता आणि त्यांच्या मूर्तींनाही स्वीकार करण्यात आला. त्यामुळे सूर्याची मूर्तिरूपातील पूजा भारतात सुरू झाली. त्यांच्या पद्धतीनुसार पायात जोडे घातलेली सूर्याची मूर्ती ते पूजत असत. तिचा तसाच स्वीकार करंण्यात आला. याचबरोबर  सूर्यमूर्तीवरील काही पाश्चात्त्य प्रभावही तसेच स्वीकारले गेले. यामुळे सूर्याच्या मूर्तीमध्ये गुडघ्यापर्वन उंच असे गमबुटासारखे जोडे घातलेले दिसतात. हिंदू देवतांमध्ये पादत्राणे घातले असलेली ही एकमेव मूर्ती आहे. सूर्याची ही मूर्ती मंदिरांमध्ये बाह्य भिंतींवर तसेच सूर्यमंदिरातील गर्भगृहातही दिसते. सूर्याच्या उपासकांना सौरपंथी असे म्हणत.
    पादत्राणांसहित मूर्तीला सामावून घेण्यासाठी पुराणात काही कथाही आलेल्या दिसतात, श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला कुष्ट झाले ते बरे होईना म्हणून त्याने सूर्याची उपासना केली. त्यामुळे से विकारमुक्त झाला, परंतु गुडघ्याखालील भाग मात्र रोग मुक्त झाला नाही म्हणून त्याला तो भाग झाकावा लागला. मार्कंडेय पुराणातील दुसऱ्या एका कथेनुसार त्वष्ट्याची मुलगी संज्ञा ही सूर्याला दिली होती. त्याचे बेडौल रूप सुंदर करण्यासाठी मुलीच्या आग्रहाखातर त्याने सूर्यास तासण्यास सुरुवात केली. गुडघ्यापर्यंत आल्यावर मात्र सूर्याला ते असह्य झाले आणि तेथेच त्याने ते तासणे थांबविले, त्यामुळे गुडघ्याखालचे त्याचे पाय तसेच राहून गेले पण गुडघ्याखालचा भाग मात्र झाकून टाकला. तिसऱ्या कथेमध्ये त्वष्ट्याची मुलगी संध्या ही सूर्याची बायको. परंतु तिला त्याचे तेज असह्य झाल्यामुळे ती आपले प्रतिरूप छाया हिला घरी ठेवून थंड प्रदेशात जाऊन घोडीच्या रूपात राहू लागली. तिचा शोध घेत सूर्य त्वष्ट्याकडे गेला असता तुझे तेज कमी केल्याशिवाय ती तुझ्या बरोबर राहणार नाही असे त्याने सांगितले. तेव्हा त्याचे ते तेज कमी करण्यासाठी त्वष्ट्याने सूर्याला तासले. तो सुंदर आणि सहनीय झाल्यानंतर घोड्याच्या रूपात संध्येकडे गेला. त्यांच्या त्या रूपातील संयोगातून अश्विनीकुमार आणि रेवंत नावाची संततीही त्यांना झाली. (जोशी: १९७९, पृ.३५२)
    मूळ सूर्याच्या उपासकांची संख्या कमी असल्यामुळे सूर्य मंदिरांचीही संख्या फारच कमी आहे. काश्मिरमधील मार्तंड मंदिर, खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिर, गुजरातमधील मोढेरा गावातील मंदिर, ओडिशा मध्ये कोणार्क या स्थानी सूर्यमंदिरे आहेत.
चित्र क्र. ११७: सूर्य मंदिर, मोडेरा, गुजरात

    अन्य ठिकाणी अशीच मंदिरे असतीलही परंतु बीजामंडल (विदिशा, म.प्र.) यासारखी त्यांची गत असणार. येथे एक प्रचंड सूर्यमंदिर होते, परंतु औरंगजेबाने ते उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधली. १९७४ साली पुरातत्व खात्याच्या सांगण्यावरून तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी ती वास्तू खात्याच्या ताब्यात दिली. तेथील मशीद पाडून तेथे पुन्हा मंदिर पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे,त्या ठिकाणच्या भग्न करण्यात आलेल्या मंदिराचे अवशेष गोळा करून ठेवले होते त्यांची जोडणी सुरू आहे. सूर्य मंदिराबाबत अजून एक गोष्ट लक्षात आलेली आहे. ती म्हणजे खग्रास ग्रहणाच्या सावलीचा काळा पट्टा देशातील ज्या भागांवरून जातो त्या भागातच सूर्य मंदिरे उभारलेली दिसतात. काही वर्षांपूर्वी अशा खग्रास ग्रहणाच्या सावलीचा पट्टा कोणार्क आणि मोढेराच्या मंदिरावरून गेला. 
    मूर्तिकलेमध्ये मात्र ग्रीकांच्या हेलीऑस नावाच्या सौंदर्यदेवतेच्या रथारूढ शिल्पांकनाचा प्रभाव दिसतो. सुरुवातीला त्याच्या रथाला चार घोडे, कधी चाके दाखविलेली, कधी एकच चाक असे कुषाण काळाचे शिल्पांकन दिसते. गुप्त काळामध्ये स्यांबरोबरच त्याच्या राशींचेही शिल्पांकन दिसते आणि त्या प्रत्येक राशीत एक सूर्वप्रतिमा दिसते. हेच ते बारा आदित्य होय. आठव्या शतकानंतर मात्र सूर्यप्रतिमांचे सपरिवार असे शिल्पांकन दिसते. तसेच दहाव्या शतकापासून सूर्याची स्वतंत्र मंदिरेही दिसतात. विष्णुधर्मोत्तर पुराणाप्रमाणे सूर्याचा परिवार बराच मोठा आहे. स्वतः सूर्य, त्याच्या सोबत हातात दंड घेतलेला दंड नावाचा त्याचा एक सेवक व लेखणी आणि दौत घेतलेला पिंगल हा दुसरा सेवक, सिंहध्वज, यम, रेवंत दोन मनू असे चार मुलगे, राज्ञी, रीक्षुभा,छाया व सुवर्चासा अशा बायका, अरुण हा सारथी, गायत्री, उष्णीक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप आणि जगती हे सप्तछंदात्मक सात घोडे, भोवती फिरणारे इतर ग्रह, शरसंधान अणाऱ्या उषा आणि प्रत्युषा दोन देवी,इत्यादिकांचा मेळावा सूर्याचा परिवार म्हणून गाजतो. याबरोबरच स्तवन म्हणणारे ऋषी, रथिकाबिंबातील देव वगैरे असतात ते वेगळेच.
 
 
 
चित्र क्र. ११८ : सूर्य, सूर्य मंदिर, कोणार्क
 
 
 
 
 
 
चित्र क्र. ११९ : सूर्य, सूर्य मंदिर, कोणार्क

कोणार्क येथील सूर्य मंदिरात मास, दिवस आणि सवत्स यांच्याही मूर्ती कालवाचक देवता म्हणूनच दिसतात. तेथील मुख्य मंदिरातील गर्भगृहात असलेली सूर्याची मूर्ती दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात हलवली असून गर्भगृहाबाहेरील देवकोष्ठांमध्ये तीन वेगळ्या सूर्याच्या मूर्ती आहेत. त्यांची नावे पूषण, मित्र, भास्कर (हरिदश्व) ही आहेत. भास्कराची मूर्ती उत्तरेकडील देवकोष्ठामध्ये असून तो अश्वारूढ आहे. पूषण आणि मित्र यांच्या मूर्ती मात्र रथारूढ असून अलंकृत आहेत. पुषणाच्या डोक्यावर उंच किरीट मुकुट असून मित्राची केशभूषा ही गोलाकार टोपाच्या आकारात आहे. यातील तिन्ही मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव वेगळे आहेत. उगवणारा सूर्य हा प्रसत्र दिसतो, माध्यांनीचा भास्कर हा तेजःपुंज असून मावळतीचा सूर्य काहीसा गंभीर दिसतो. (जोशी: १९७९) खजुराहो येथील संग्रहालयातील सूर्यमूर्तींमध्येही असेच भाव आढळून येतात.

१४. नवग्रह









चित्र क्र. १२० : नवग्रह शुक्र, लक्ष्मण मंदिर, खजुराहो

   नऊ ग्रह आणि बारा राशी यावर भारतीय ज्योतिष आधारलेले आहे. यामुळे ग्रह, त्यांची स्थाने आणि ह्यांची अनुकूलता याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो असा एक दृढ समज आहे. त्यामुळे अन्य देवतांप्रमाणे ह्यांचेही पूजन करावे आणि त्यांची अवकृपा होऊ नये म्हणून त्यांची शांती करण्याची पद्धत रूढ आहे. हे नऊ ग्रह म्हणजे इंग्रजी भाषेत ज्याला प्लॅनेट म्हणतात हे नसून आपल्याला पृथ्वीवरून कुठल्याही साधनांशिवाय नुसत्या डोळ्यांनी दिसणारे आपल्या सूर्य मालिकेतील हे नऊ य्टक होत. त्यामुळे यामध्ये सूर्य (रवि), चंद्र (सोम), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, राहू व केतू यांचा समावेश होतो. यावरूनच सप्ताहातील वारांची नावे आहेत आणि या वारांचा क्रम या ग्रहांची पृथ्वी सापेक्ष गती किती या वरून ठरलेला आहे. राहू आणि केतू हे इतर ग्रहांप्रमाणे दिसणारे ग्रह नाहीत. ज्या वर्तुळाकारमागनि पृथ्वी भोवती चंद्र फिरतो, तो मार्ग आणि ज्या मार्गाने पृथ्वी सूर्याभोवती फिरते तो मार्ग, हे दोन मार्ग अवकाशात परस्परांना ज्या दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदतात त्यापैकी एका छेदन बिंदूला राहू आणि दुसर्याला केतु म्हणतात. या दोन बिंदूंना संपात बिंदू असेही म्हणतात. फलज्योतिषामध्ये यांना स्वतंत्र ग्रह मानले असून त्यांची स्थाने एकमेकांसमोर १८० अंशावर कल्पिली आहेत. ह्यांना गती असल्यामुळे त्यांना ग्रह मानले आहे आणि सूर्याभोवती प्रदक्षिणेचा त्यांचा काळ १८ वर्षांचा आहे. यापैकी सूर्याला स्वतंत्र देवतेचे स्थान प्राप्त झाले आणि त्याची मंदिरेही बांधली गेली. त्याच प्रकारे चंद्राचे स्वतंत्र शिल्यांकन काही ठिकाणी आढळले आहे, ज्यात त्याच्याही रथाला घोडे दाखवले आहेत. गढवा ( उत्तर प्रदेश ) येथील मिळालेल्या एका द्वारपट्टीकेवरील शिल्पांमध्ये चंद्राबरोबर त्याची पत्नी रोहिणी हिचेही शिल्पांकन आढळते. (जोशी : १९७९, ५.३६९), चंद्राची स्वतंत्र मंदिरे मात्र नाहीत. आधुनिक काळामध्ये नवग्रहांपैकी शनीची मंदिरे असून त्यात मारुती सदृश शनीच्या मूर्ती आढळतात. परंतु प्राचीन काळी शनीची मंदिरे नव्हती. मंदिराच्या शिल्पांकनामध्ये सर्वसाधारणपणे नवग्रहपट्टी या स्वरूपात ग्रहांचे शिल्पांकन दिसते, गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील तुळईवरही नवग्रहपट्ट दिसतात. यातील पहिले सात ग्रह पुरुष रूपात कोरले असून त्यांच्यात फारसे भेद नसतात. राहू आणि केतू मात्र एकत्र दिसतात ज्यास केतूच्या डोक्यावर राहूचे फक्त शिरच कोरलेले असते. सर्वाधिक नवग्रहपट्ट खजुराहोमध्ये दिसतात. पूर्ण मूर्तिरूपात सात ग्रहांचे (राहू केतू वगळून) शिल्पांकन खजुराहोमधील लक्ष्मण मंदिराभोवतालच्या देवकोष्ठामध्ये पाहायला मिळते. या मंदिराभोवती नऊ देवकोष्ठे आहेत. त्यातील  मुखमंडपाखालील दक्षिण भिंतीपासून पाहायला सुरुवात केल्यास पहिल्या देवकोष्ठात महाभारत लिहिणारा गणपती असून त्यापुढील प्रत्येक देवकोष्ठामध्ये एक ग्रह आणि अंतिम देवकोष्ठात दुर्गा अशी रचना असून शनी, गुरू, बा. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या क्रमाने ते बसवलेले आहेत. (देसाई १९७४) 

चित्र क्र. १२१ : शनि, लक्ष्मण मंदिर, खजुराहो

चित्र क्र. १२२ सूर्य, लक्ष्मण मंदिर, खजुराहो

   विष्णू या देवाची अवकाश कल्पना साकारण्यासाठी ही रचना केली आहे. (शंकराच्या मंदिरात बाहेरील देवकोष्ठात मातृकाच असतात.) या ग्रहांची आयुधे आणि वाहने रूपमंडन या ग्रंथांशी साधर्म्य दाखवतात परंतु ते सर्व ग्रंथाला धरूनच आहेत असे नाही. खजुराहोमधील नवग्रहांचे संशोधन श्रीमती देवांगना देसाई यांनी कलेले आहे. 
चित्र क्र. १२३ बृहस्पती, लक्ष्मण मंदिर, खजयहो

चित्र क्र. १२४ : बुध, लक्ष्मण मंदिर, खजुराहो

 गणपती शेजारील पहिला ग्रह त्यांनी शनी असल्याचे म्हटले आहे. शनीच्या रथाला आठ गाये ओढतात किवा तो महिषारूढ असतो. परंतु येथे मात्र तो कमळावर उभा आहे. परंतु त्याच्या हातामधील अक्षमाळेवरून तो ओळखलेला आहे. त्याच्या शेजारील देवकोष्ठात बृहस्पती किंवा गुरूचे शिल्प आहे. त्याचे वाहन हंस त्याच्याजवळ असून त्याच्या हातातील आयुधांपैकी पुस्तक आणि माला स्पष्ट दिसतात. पुढील देवकोष्ठात कमळावर उभा असलेला हा ग्रह त्याच्या डोक्यावरील चंद्रकोरी मुळे चंद्र असल्याचे नक्की होते. ग्रंथाप्रमाणे चंद्राच्या रथाला दहा घोडे असणे आवश्यक असते. परंतु येथे ते दिसत नाही. त्याच्या दोन उजव्या हातापैकी खालचा वरद मुद्रेत आणि वरच्या हातात पद्म ही त्याची ज्ञात प्रतिके असतात. बरोबर पश्चिमेकडील मागील बाजूस सपरिवार सूर्याची उत्तम मूर्ती आहे. यात त्याचा सारथी आणि घोडे नाहीत. समभंग अवस्थेत उभ्या असलेल्या या सूर्याच्या पायात गुडघ्यापर्यंत आलेले जोडे दिसतात. त्याच्या पायाशी असलेल्या मूर्तीमध्ये त्याच्या उजवीकडे हातात लेखणी घेतलेला पिंगल आणि डावीकडे दंड किंवा दंडी हे मुख्य सेवक दिसतात. त्यांच्या चार बायकांपैकी दोघीजणी शेजारी असून त्यांच्या दोन पायाच्यामध्ये तिसरी (बहुधा छाया) उभी आहे. त्याच्या शेजारील कोनाड्यात हात जोडून बसलेले त्याचे दोन मुलगे यम आणि रेवंत आणि त्यांच्या पाठीमागे घोड्याचे तोंड असलेले अश्विनीकुमार. त्याच्या वरच्या बाजूला हातात धनुष्यबाण घेतलेल्या उषा आणि प्रत्युषा असून त्यांचे सर्व हात तुटले असल्यामुळे हातातील कमळे मात्र दिसत नाहीत. पुढील देवकोष्ठातील ग्रह हा मंगळ असून त्याचे डोके तुटले आहे. परंतु त्याच्या पायाखाली त्याचे वाहन मेष स्पष्टपणे दिसते आहे. त्यांच्या पुढील देवकोष्ठातील ग्रहाचा चेहरा आणि तीन हात तुटलेले आहेत, परंतु त्याच्या पायाजवळ बसलेला हत्ती दिसतो आहे. श्रीमती देवांगना देसाईंच्या मते बुधाचे वाहन नाग असते आणि नाग ह्याचा अर्थ हत्ती असा सुद्धा होतो म्हणून ही बुध या ग्रहाची मूर्ती असल्याचे म्हटले आहे. त्या मालिकेतील शेवटला ग्रह म्हणजे शुक्र. त्याच्या चार हातांपैकी तीन हात शिल्लक असून त्यामध्ये पुस्तक, माळा आणि पद्म त्याने धरले असून चौथ्या हातात कमंडलू असावे. याची ओळख याच्या वाहनामुळे स्पष्टपणे होते. याचे वाहन भेक किंवा दर्दुर असते. या उभ्या मूर्तीच्या पायाखाली बेडूक (दर्दुर) स्पष्टपणे दिसतो (देसाई: १९९६). शुक्र या ग्रहाचा आपल्या जीवनावरील परिणाम पाहता, त्याला बेडूक वाहन देण्याच्या कल्पकतेचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये नवग्रहांची मंदिरे आहेत. त्या ठिकाणी ग्रहपीडेनुसार त्या त्या ग्रहांचौ स्वतंत्र पूजा करायची व्यवस्था आहे.

१५. दिक्पाल

चित्र क्र. १२५ : दिक्पाल अग्नी, खजुराहो

कणाद ऋषींनी दिग् हा शब्द अवकाश या अर्थाने वापरला आहे. दिशांचे भान आल्याशिवाय अवकाशाची जाणीव होत नाही. पृथ्वीला दोन ध्रुवस्थाने असल्याने दक्षिण आणि उत्तर ह्या दिशा समान पाहत असून पूर्व पश्चिम ह्या स्थानसापेक्ष राहतात. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात राहत असणाऱ्या लोकांना ध्रुव ताऱ्यामुळे उत्तर दिशेचे निश्चितीकरण हे करता येते. याशिवाय या चार दिशांमधील अन्य चार जगदिशा आणि वर आणि खाली (ऊर्ध्व आणि अधर) अशा एकूण दहा दिशांची कल्पना केलेली आहे. यांपकी ऊर्ध्व आणि अधर सोडून अन्य दिशांच्या रक्षक देवतांना किंवा अधिपतींना दिक्पाल ही संज्ञा आहे त्या त्या दिशांचे ते रक्षण करतात अशी समजूत आहे. पूर्वेचा इंद्र, पश्चिमेचा वरुण, उत्तरेचा कुबेर,दक्षिणेचा यम, अग्नेयचा अग्नी, नैऋत्येचा निर्ऋती, वायव्येचा वायू आणि ईशान्येचा ईश्वर किंवा ईशान अशी या आठ म्हणजे अष्ट दिक्पालांची नावे आहेत. मंदिरांमध्ये हे दिक्पाल त्या त्या दिशांना वसवलेले आढळतात. मंदिरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात दोन याप्रमाणे हे दिक्पाल त्या त्या दिशांना तोंड करून बसविलेले असतात. काही मंदिरांमध्ये ते एकमेकांपासून ठराविक अंतरावर वसविलेले असतात. दिक्पाल ओळखणे फार सोपे असते. कारण ते त्या त्या दिशांनाच असतात. खिद्रापूरच्या (जि. कोल्हापूर) कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडपात सर्व दिक्पाल त्यांच्या शक्तींसमवेत वाहनांवर आरूढ  असल्याचे दिसतात.

चित्र क्र. १२६ : दिक्याल ईशान, कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर

 इंद्राचे वाहन ऐरावत (हत्ती) आणि शस्त्र वज्र आणि अंकुश असते. शची त्याची पत्नी असते. वरुणाचे वाहन मकर (मगरीसारखा प्राणी) असून त्यांच्या हातात पद्म, पाश, शंख, घट (रत्नपात्र) असते. त्याच्या पत्नीचे नाव गौरी असते. कुबेराचे वाहन नर (जिवंत माणूस) असून त्यांच्या हातात गदा आणि शक्ती ही आयुधे असतात. त्याच्या पत्नीचे नाव वृद्धी असते. यमाचे वाहन महिष (रेडा) असून, त्याच्या हातात त्रिशूळ, दंड किंवा खड्ग असते. त्याच्या पत्नीचे नाव धुमोर्णा अग्नीचे वाहन मेष. त्यांच्या हातात ज्वाळा किंवा त्रिशूल असून त्यांची पत्नी स्वाहा असते. निर्ऋतीचे वाहन शव (प्रेत) असून त्याच्या हातात खड्ग, खेटक आणि मुंड (माणसाचे कापलेले मुंडके) असते. हे भैरवाचे रुप असल्यामुळे अनेक शिल्पात तो नग्न दाखवला जातो (जैन मंदिर, खजुराहो). याला चार बायका असतात. त्यांची नावे देवी, कृष्णांगी, कृष्णवदना, कृष्णपाशा अशी असतात ईशान हे शंकराचेच रूप असल्यामुळे त्याचे वाहन बैल असते. त्याच्या हातामध्ये नाग आणि त्रिशूळ ही त्याचे आयुधे असतात. वायूला 'उत्तमभूत', 'अशरीरी 'आकाश', आणि 'शीघ्रग' अशी नावे दिली आहेत. हेच वायूचे खरे चित्रण होय. असून त्याचे वाहन प्रामुख्याने मृग म्हणजे हरीण असते. क्वचित ठिकाणी चालणारा माणूसही त्याचे वाहन असते. त्याच्या पत्नीचे नाव शिवा
खजुराहोच्या मंदिरातील वायूच्या प्रतिमा चौभुजी आहेत. तिथे त्याच्या हातात ध्वज, पुस्तक, कमळाची कळी, अक्षमाला आणि कमंडलू आहेत. (जोशीः १९७९).

चित्र क्र. १२७ : दिक्पाल अग्नी, सूर्य मंदिर, मोढेरा

चित्र क्र. १२८ : दिक्पाल, डावीकडून ईशान, अग्नी, वायू आणि वरुण, वेरूळ

  सर्वच मंदिरांमध्ये दिक्पालांचे शिल्पांकन नसते. खजुराहोच्या मंदिरांप्रमाणे मोढेरा (गुजरात) येथील अकराव्या शतकातील सूर्यमंदिरात मोठ्या आकारात बसविलेल्या दिक्पालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. वेरुळच्या कैलास मंदिराच्या दर्शनी भिंतीवर (समोरच) अष्ट दिक्पालांचे शिल्पांकन केलेले दिसते. इथे कलाकारांनी त्यांना एका सरळ रेषेत म्हणजे एकाच दिशेला तोंड करून कोरलेले आहेत.

१६. बौद्ध प्रतिमा

चित्र क्र. १२९ : गौतम बुद्ध, विश्वकर्मा लेणे, वेरूळ

गौतम बुद्ध :-

    भगवान बुद्ध इ.स.पूर्व पाचव्या-सहाव्या शतकात होऊन गेले. इ.स. पूर्व ५६३ ते ४८३ या काळात वैचारिक प्रगती बरोबरच भारतामध्ये भौतिक भरभराटही झाली होती. सरस्वती-सिंधू-संस्कृती नंतरचे दुसरे नागरीकीकरण झालेले होते जे परत एका समृद्ध अवस्थेपर्यंत येऊन पोहोचलेले होते.
    भटक्या टोळ्यांचे समुदाय, पोटासाठी फिरणारे असे समाजाचे स्वरूप जाऊन महाजनपदांमध्ये भौगोलिक वाटणी होऊन त्यांच्या प्रमुख राजधान्या आणि राजघराणी प्रस्थापित झालेली होती. त्यापैकी मगध साम्राज्य हे सर्वात बलशाली होते. त्याची राजधानी राजगृह म्हणजे आजचे बिहार प्रांतातले राजगीर. गंगेच्या उत्तरेस लिच्छवींचे एक राज्य होते आणि वैशाली ही त्याची राजधानी होती. गंगेच्या वायव्येस कोसलांचे राज्य होते ज्यांची राजधानी श्रावस्ती होती. कोसल देशाच्या पूर्वेस रोहिणी नदी वाहत होती आणि या नदीच्या तीरांवर समोरासमोर शाक्य आणि कोलिय या दोन कुलांची स्वतंत्र गणराज्ये होती. शाक्य हे क्षत्रिय कुल होते व त्यांची कपिलवस्तू ही राजधानी होती ज्यात शुद्धोदन नावाचा राजा राज्य करीत होता.
     शाक्य आणि कोलिय या दोन राज्यांमध्ये नदीच्या पाण्यावरून त्याही वेळेस वाद सुरू होते. या दोन्ही गणराज्यांनी रोहिणी नदीवर एक धरण बांधले होते आणि पाणी वाटपाचा करारही केला होता. पूर्वीपासून तेथे कधी लहान संघर्ष आणि काही युद्धेही या पाणी वाटपावरून झालेली होती. कोलिय राजाने पाणी संघर्ष मिटविण्यासाठी, महामाया आणि महाप्रजापती नावाच्या आपल्या दोनही मुलीची लग्ने शुद्धोदन राजाशी लावून पारिवारिक संबंधही दृढ केले होते. बऱ्याच वर्षानंतर मोठी राणी महामाया हि झाली. तिला प्रसूतीसाठी तिच्या माहेरी देवदेह नगरीत पाठविण्यात आले. प्रवासामध्ये विश्रांतीसाठी लुम्बिनी नामक उपवनात ती थोड्यावेळ थांबली होती. (लुम्बिनी हे सध्या नेपाळमध्ये आहे ) तिथे तिने एका झाडाची फांदी धरली असता ती तिथेच उभ्या उभ्या प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. प्रसूतीनंतर तिला परत कपिलवस्तूला आणण्यात आले. हा मुलगा म्हणजे सिद्धार्थ, ज्याचे राशीनाम गौतम होते. प्रसूतीनंतर सातव्या दिवशी महामायेचा मृत्यू झाला आणि महाप्रजापती हि गौतमची दुधाई आणि पुढे तीच त्याची आई झाली.
   गौतमाच्या जन्मानंतर असित नावाचे मुनी राजवाड्यात आले आणि त्यांनी त्याची जन्मपत्रिका काली. त्यांनी शुद्धोदनाला सांगितले की, हा मुलगा जगाला अपूर्व धर्मज्ञान देईल, परंतु त्याने कुठलेही दु:ख पाहिल्यास तो भौतिक जीवनाकडे पाठ फिरवून निघून जाईल. एकतर अनेक वर्षांनी पुत्ररत्न प्राप्त शालेले असल्यामुळे आणि त्याची खरी आई पण गेली असल्यामुळे त्याला अत्यंत लाडात वाढविण्यात आले होते. अनेक श्रेष्ठ गुरूंना बोलावून घेऊन त्यांच्याकडून त्याने भाषा, व्याकरण, वेदांगे आणि अन्य विषयांचे ज्ञान घेतले. अत्यंत प्रखर बुद्धिमत्तेचा असल्यामुळे सोळाव्या वर्षीच तो विद्या कलांमध्ये पारंगत झाला. इतकेच नाहीतर अश्वारोहण, धनुर्विद्या आणि अन्य युद्ध कलामध्ये तो निष्णात झाला. सोळाव्या वर्षीच एका धनुर्विद्येच्या स्पर्धेमध्ये त्याने सर्व स्पर्धकांना हरवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. या विजयाबद्दल त्याला कोलिय राजकुमारी यशोधरा ही मिळाली आणि तिच्याशी त्याचा विवाह झाला. विवाहानंतर शुद्धोदनाने त्याला तीन ऋतुंसाठी तीन मोठे प्रचंड राजवाडे बांधून दिले, ज्याच्या सजावटीमध्ये नृत्यांगना, गयक, वादक यांचाही समावेश होता. सतत सुखच दिसत राहावे याचा आटोकाट प्रयत्न त्याने केला. त्याच्या जवळ २९ व्या वर्षापर्यंत त्याने बाहेरचे जग आणि कठलेही दुःखच पाहिले नव्हते. त्याच वर्षी त्याला मुलगा झाला, ज्याचे नाव राहल ठेवले गेले. त्याच सुमारास एक दिवस त्याला वाड्याबाहेरील जग पाहण्याची इच्छा झाली. शुध्दोधनाने आधी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तो हट्टालाच पेटला तेव्हा त्याने त्याला अनुमती दिल्ली. परंतु त्याच्या नगर संचाराच्या वेळी त्याला कोणीही पंगु, म्हातारे, रोगी दिसणार नाहीत अशी व्यवस्था करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे नगरात सर्व व्यवस्था केली गेली ते सजवले गेले आणि मगच गौतमाची स्वारी बाहेर पडली.
चित्र क्र. १३० : गौतमाचा गृहत्याग, सांची

       ते दृश्य पाहून गौतम हरखून गेला. राजवाड्याबाहेरील जग हे सुंदरच आहे असे त्याला बाटले. परंतु थोड्याच वेळाने त्याला जर्जर म्हातारा दिसला. छन्न नावाच्या आपल्या सारथ्याला त्याने विचारले की, "याला काय झाले?" त्यावर सारथ्याने त्याला म्हातारपण आले आहे असे सांगितले. "म्हणजे मी पण एक दिवस असाच कुरूप होईन का ? माझ्याही अंगावर असेच व्रण आणि सुरकुत्या येतील का?" यावर छन्न म्हणाला, "होय महाराज, हे सर्वांच्याच नशिबी चाढून ठेवलेले असते." आपले हे तारुण्याचे तेज, हे सौंदर्य आणि हा तारुण्याचा आवेश एक दिवस नष्ट होणार या कल्पनेनेच गौतमाला अतीव दुःख झाले. पुढे त्याला एका महारोग्याचे दर्शन झाले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की नुसतेच वार्धक्य येते असे नाही तर अनेक व्याधीही या शरीराला ग्रासू शकतात. पुढे त्याला एक प्रेतयात्रा दिसली आणि त्याने पहिल्यांदा मृत्यू पाहिला आणि आपणही एक दिवस मरणार हे कटू सत्य त्याला कळले. हे जग जेवढे दिसते तेवढे सुंदर तर नाहीच नाही परंतु सुखी तर अजिबातच नाही हे त्याच्या लक्षात आले. येथून त्याचे चिंतन बदलले आणि तो अंतर्मुख होऊन रात्रंदिवस विचार करू लागला. आषाढ पौर्णिमेच्या मध्यरात्री तो उठला आणि त्याने यशोधरेला आणि तिच्या कुशीत झोपलेल्या राहुलला एकदा डोळे भरून पाहिले आणि तो महालातून बाहेर पडला. त्याने छन्न नावाच्या सारथ्याला उठवले आणि त्याच्या आवडत्या कंथक नावाच्या घोड्यावर बसून तो नगरातून बाहेर पडला. छन्नही त्याच्याबरोबरच निघाला. पहाटेच्या सुमारास तो अनोमा नदीच्या तटापाशी आला. तेथे त्याच्या राज्याची सीमा संपत होती. त्याने आपले रेशमी वस्त्र आणि अलंकार उतरवले त्या वेळेस छन्नाच्या लक्षात   की हा घर सोडून निघाला आहे. त्याने त्याच्या परीने त्याला अडवायचा बराच प्रयत्न केला. परंतु याचा निर्धार कायम होता. शेवटी तो म्हणाला की, तुमच्या जाण्याने तुमचे आई वडील, तुमची आणि मुलगा हे किती दुःखी होतील याचा विचार करा. त्यावर गौतमाने त्याला उत्तर दिले की, श्री साऱ्या जगाचेच दुःख दूर करण्यासाठी निघालो आहे आणि तसे जर झाले तर यांचेही दुःख आप नष्ट होणारच आहे. (जोशी, भा.स.को.: १९७०)
चित्र क्र. १३१ : बोधीवृक्ष, सांची
   
      शिल्पकलेमध्ये भगवान बुद्धाच्या जीवनातील ह्या टप्प्या पर्यंतची शिल्पे आढळतात, ज्यामध्ये महामायेचे स्वप्न, आसिताची भविष्यवाणी आणि गौतमाचा गृहत्याग आणि अन्य काही प्रसंगाचे शिल्पांकन असते. गौतम बुद्धाने ज्या ठिकाणी छन्नाला अलंकार दिले ते स्थान केसरीया या गावी बिहारमध्ये असून तेथे एक भव्य स्तूप सापडला आहे.
     गृहत्यागा नंतरची जवळजवळ १४ वर्षे त्याच्या कठोर साधनेची आणि उग्र तपश्चर्येची होती. सुरवातीला आलार कालाम या राजगृहाजवळ राहणाऱ्या संन्यासाचे शिष्यत्व घेतले, त्याच्याकडून तो नास्तिकवाद शिकला. नंतर त्याने उद्रक नावाच्या दुसऱ्या गुरूकडे जाऊन ज्ञान प्राप्त केले. परंतु तरीही याचे समाधान झाले नाही. पुढे सहा वर्षे त्याने योग साधना करून हठयोगाचे काही उग्र प्रकारही केले. त्याचे संपुर्ण शरीर अस्थिपंजर झाले. एका वृक्षाखाली बसून त्याने अनेक दिवस साधना केली आणि एके दिवशी त्याला बोधी प्राप्त झाली. तो दिवस वैशाख पौर्णिमेचा होता. त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या समोर सुजाता नावाची गुरे राखणारी मुलगी उभी होती. तिने फळांचा रस त्याला दिला. ( पुढे बौद्ध वाङ्‌मयात सुजाता ही राजकन्या होती असे लिहिले गेले आणि तिने सुवर्ण पात्रात बुद्धाला खीर दिली असा उल्लेख येतो). याच्या नंतरही त्याने सात आठवडे तशीच तपश्चर्या केली आणि त्याला धर्मत्तत्त्वाचा साक्षात्कार झाला. त्याचे पूर्वाश्रमीचे पाच सहयोगी हे वाराणसी जवळच्या ऋषीपत्तनात राहतात हे कळल्यावर तेथे गेला आणि त्या पाचही जणांनी याचे शिष्यत्व घेतले. तेथून जवळच असलेल्या सारनाथ येथे त्याचे पहिले प्रवचन झाले. जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी त्याला कारणीभूत असणारी तृष्णा संपली पाहिजे असे  त्यानी सांगितले आणि त्याने आठ तत्त्वांचे निवेदन केले, ज्याला त्याने निर्वाणप्राप्तीचा अष्टांग मार्ग असे म्हटले. याच पाच शिष्यांसह त्याने बौद्ध संघ सुरू केला आणि तिथून बौद्ध पंथाचा उदय झाला. (जोगी भा.सं.को. १९७०)
चित्र क्र. १३२ : बुद्धाचे प्रवचन, सांची

    याच्या प्रचारासाठी त्याने संघटनात्मक बांधणी केली आणि त्याची ही संघटन त्याच्या मृत्यूनंतर १३०० वर्षे हिंदुस्थानात कार्यरत होती. मृत्यूनंतरही ते कार्य तितक्याच दृढतेने आणि निष्ठेने वर्धिष्णू ठेवण्याचे श्रेय हे जसे त्याच्या असंख्य अनुयायांना जाते तसेच ते भगवान बुद्धाचे व्यक्तित्मत्त्व त्यांचे विचार आणि त्यांच्या विशेष अशा कार्यप्रणालीलाही जाते. त्या वेळच्या वैदिक धर्माचे अनुसरण करणाऱ्या समाजामध्ये समृद्धीबरोबर येणारी विलासीनताही बोकाळली होती. इतकेच नाही तर यज्ञाचे मूळ उद्दिष्ट जाऊन तेथे हजारो प्राण्यांचे बळी देण्याचे भयानक कर्मकांड सुरू होते. याला योग्य दिशा देण्याचे काम हे भगवान बुद्धाने केले. ज्यांनी तो पंथ स्वीकारला नाही त्यांनीही त्यातल्या योग्य गोष्टी मात्र आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. च्या सातव्या, आठव्या शतकानंतर भारतातून बौद्ध पंथाचा ऱ्हास झाला. परंतु गौतम बुद्धांच्या विचारांचा परिणाम सर्व भारतीयांच्या जीवनावर आजही दिसून येतो, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या सत्य, अहिंसा, अस्तेय आणि ब्रह्मचर्य वा चार गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. खरे बोलणे आणि खरे वागणे याला बुद्धांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. प्राण्यांनाही जीव असतो म्हणून त्यास मारू नये ही अहिंसेची शिकवण त्यांनी दिली. आपल्या चैनीसाठी इतरांचे धन किंवा संसाधने वापरणे याला त्यांनी चोरी (अस्तेय) म्हटले. ब्रह्मचर्य याचा अर्थ सार्वजनिक जीवनामध्ये सांभाळायचे शील. या शीलाचा आग्रह धरणारे भगवान बुद्ध हे पहिले संत म्हणावे लागतील. मानवी समाजामध्ये श्रेष्ठ आदर्श निर्माण करणारे हे त्यांचे विचार खरोखरच थक्क करणारे आहेत. यामुळे या पंथाला गती मिळाली आणि अनेक शतके मोठ्या प्रमाणात राजाश्रयही मिळाला.
       इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने याला खूपच मोठी चालना दिली. त्याने स्वतः हा पंथ स्वीकारला नाही परंतु आपल्या मंत्रीगणांमध्ये धर्ममहामात्र हे पद निर्माण केले आणि हे एक संन्यासी भिक्षुच धारण करू शकत असे. अशोकाचे राज्य हे आजच्या इराणच्या पूर्वेपासून ब्रह्मदेशापर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जवळजवळ सर्व भारतभर पसरलेले होते. एवढ्या मोठ्या सलग प्रदेशाचा एकछत्री अंमल असणारा जगातला तो एकमेव राजा आहे. भौगोलिक विस्तार आणि धर्मप्रशासक याच्यामुळे तिबेट आणि सिलोनमध्येही हा पंथ त्या वेळेस त्याने पोहोचवला. अफगाणिस्थानच्या परिसरातील काही ग्रीक सुद्धा बौद्ध झाले. असे असले तरीही बहुसंख्य प्रदेशांमध्ये वैदिक धर्माचाही प्रभाव तितकाच होता आणि आता याला थोडे धार्मिक स्पर्धेचे स्वरूप आले होते. बौद्ध शिल्पे - भारतातील देव प्रतिमांचे प्रमाणिकीकरण होण्याच्या आधीपासून बौद्ध स्थापन (स्तूप) आणि बौद्ध शिल्पकला ही लेण्यांमधून विकसित झालेली होती. गौतम बुद्धाने आपली मुर्ती किंवा चित्र (प्रतिमा) हे करू नये आणि याचे पूजनही नये असे आग्रहाने म्हटले होते. धर्माची तत्त्वे प्रस्थापित होण्यासाठी विचारमंथन होणे आवश्यक असते त्याप्रमाणे अशी तीन मंथने झाली. त्याला संगिती असे म्हटले जाते. पहिली संगिती बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेच तर तिसरी संगिती अशोकाने भरवली होती. परंतु अशोकाला मात्र त्याचे काही स्मारक असावे असे वाटल्यामुळे त्याने स्तुपांची रचना केली. यामध्ये भगवान बुद्धांचे शारीर रुपाने दर्शन होत नाही. इ.स.च्या पहिल्या दुसऱ्या शतकापर्यंत बौद्ध शिल्पांमध्ये हे असेच दिसते.
चित्र क्र. १३३ : शालभंजिका, सांची

महामायेचे स्वप्न - गौतमाच्या जन्माच्या आधी त्याच्या आईला (महामायेला) स्वप्नात एक शुभ्र ली दिसत असे. तिच्या पोटी एक महान पुत्र जन्माला येणार याचा तो संकेत मानला जातो. एक झोपलेली स्त्री आणि तिच्यावर अधांतरी असा एक हत्ती आणि बाजूला उभे असलेले काही दास दासी असे हे शिल्पात दिसते.
     शालभंजिका- साल वृक्षाखाली त्याची फांदी धरून उभी असताना गौतम बुद्धाच्या आईची प्रसुती झाली असल्यामुळे साल वृक्ष हा पवित्र मानला गेला आणि तशा उभ्या असणाऱ्या स्त्रियांची शिल्ये त्या काळात आणि नंतरही दिसतात. काही शिल्पांमध्ये शालभंजिकेच्या शेजारी हातांमध्ये वस्त्र घेतलेला एक पुरुष उभा असलेला दाखवतात. त्या वस्त्रावर नवजात गौतम आहे असे मानले जाते कारण सती रूपात दाखवायची सोय नव्हती. काही ठिकाणी त्या पुरुषाला इंद्र असल्याचेही मानले जाते.
     सुरुवातीच्या काळातील (इ.स.पू. दुसरे ते इ.स. दुसरे शतक) शिल्पांमध्ये गौतम बुद्धाला दाखविण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हांचा उपयोग केला गेला. त्यात
१) पांढरा हत्ती
२) कमळ - बुद्धाने टाकलेली पहिली सात पावले
 ३ ) घोडा- अलंकृत घोडा ज्यावर छत्र धरले आहे, ह्या घोड्यावर बसून त्याने गृहत्याग १ (महाभिनिष्क्रमण) केला.
४) बोधीवृक्ष- बुद्धगयेला पिंपळाच्या वृक्षाखाली बोधी प्राप्त झाली त्याला 'बोधीवृक्ष' असे नाव दिले गेले. त्या काळातील शिल्पांमध्ये दाखविलेला वृक्ष म्हणजेच गौतम बुद्ध यात काही ठिकाणी वृक्षाच्या खाली चौथरा किंवा काही ठिकाणी सजवलेला कठडाही दिसतो.
५) वज्रासन- बोधीवृक्षाखाली किंवा नुसतेच आसन काढलेले असते. त्यावर बसून बुद्धाने तप केले असे मानले जाते.
६) गंध कुटी- गृहत्यागा नंतर काही वर्षे आम्रकुंजात ज्या कुटीत तो राहिला होता त्याचे है प्रतीक मानले जाते.
७) भिक्षापात्र काही शिल्पात केवळ भिक्षापात्र दिसते.
८) उष्णीष- बुद्ध मूर्तीतील डोक्यावर असणारा उंचवटा.
९) प्रभा मंडल आसनामागे एक प्रभा काढलेली असते.
१०) धर्मचक्र जे प्रतीक आजही आपल्या राष्ट्र ध्वजावर आहे.
११) पदचिन्हे- आसनावर दोन पावलांचे ठसे ज्यांना सामान्यतः आज आपण पादुका म्हणतो.
१२) त्रिरत्न- त्रिशूळासारखे एक चिन्ह
१३) स्तूप- अर्धगोलाकार उंचवटा आणि त्याभोवती वेदिका (कठडे) अशा स्वरूपातील वास्तू.

     शारीर रूपातील बौद्ध मूर्ती - अफगाणिस्थानामधील काही ग्रीक हे बौद्ध झाले आणि त्यांना शरीर रूपातील मूर्तीची आवश्यकता भासली म्हणून गांधार कलेमध्ये अस्थिपंजर झालेले शरीर दाखवून ध्यानस्थ बुद्ध मूर्ती सुरुवातीला आढळते. मथुराकलेमध्ये यावर त्यांनी तडजोडीचा तोडगा काढला. त्यांनी बोधीसत्त्वाच्या मूर्ती केल्या, ज्यामध्ये गौतम बुद्धांची ही बोधी प्राप्त करण्यापूर्वीची अवस्था सांगितली गेली. पटना (बिहार) येथील संग्रहालयाच्या दारातच धोतर नेसलेला, हातात भिक्षापात्र घेतलेल्या, दाढी असलेल्या एका पुरुषाची विशाल मूर्ती दिसते. तिला 'बल भिख्खू' असे म्हटले जाते.
     इ.स. पहिल्या शतकानंतर (कुशाण काळानंतर) बुद्ध मूर्तीचे प्रमाणिकीकरण झालेले दिसते, ज्यामध्ये आपल्याला सामान्यतः बुद्ध मूर्ती म्हटल्यानंतर जी मूर्ती डोळ्यासमोर येते त्याचा अंतर्भाव झालेला दिसतो. महापुरुषांची सात लक्षणे सांगितली गेली आहेत, जी बौद्ध आणि जैन मूर्तिकलेत समान पद्धतीने वापरलेली दिसतात.
चित्र क्र. १३४ : गौतम बुद्ध, विश्वकर्मा लेणे, वेरूळ

१. उष्णीष - अलंकृत पागोटे, डोक्यावर अंबाड्यासारखा वर आलेला केस करळे दाखवल्यामुळे बुद्धमूर्तीमध्ये केसांचीच मारलेली गाठ असावी असे दिसते. परंतु ते तसे नसते. गौतम बुद्धाने मुंडन केलेले होते. परंतु तसे मस्तक शिल्पात दाखवल्यास सौंदर्याला बाधक अकते म्हणून त्यावर कृत्रिम कुरळ्या केसांची रचना केली गेली. डोक्यातून वर आलेला भाग हा उष्णीष असून सामान्य माणसापेक्षा त्याचा मेंदू हा खूप मोठा असल्यामुळे तो कवटीत न सामावता येण्याएवढा असावा हे दाखविण्यासाठी ही कल्पना केली गेली. त्याच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचे ते प्रतीक होय.
३.उर्णा- काही शिल्पांमध्ये हे लक्षण ठळकपणे दिसते. दोन भुवयांमध्ये कुंकवासारखा एक गोलाकार उंचवटा कोरलेला असतो. ते कुंकू नसून भगवान बुद्धाचा तो तिसरा डोळा किंवा ज्ञानचक्षु होय. सामान्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने असणाऱ्या त्यांच्या दिव्यदृष्टीचे ते प्रतीक मानले जाते.
३. लांब कान- खांद्यापर्यंत लांब असलेल्या कानाच्या पाळ्या. सामान्य मानवी चेहऱ्यापेक्षा वेगळेपण दिसावे हा त्याचा हेतू.
४. मानेवरती आडव्या रेषा - शिल्पामध्ये गळ्याभोवती कोरलेल्या या रेषांची संख्या सात असावी असा संकेत असतो. बुद्धाच्या या जन्मापूर्वीच्या सात जन्मांच्या पुण्याईचे ते प्रतीक होय. परंतु सर्वच मुर्तीवर हे आढळते असे नाही तसेच या रेषांची संख्याही कमी जास्त असते.
५. छातीवरील चिन्ह - काही मूर्तीच्या छातीवर त्रिरत्न हे चिन्ह कोरलेले दिसते. पुढील काळात हिंदू शिल्पकलेत हेच चिन्ह विष्णू मूर्तीच्या छातीवर कौस्तुभ मण्याचे प्रतीक म्हणून दिसते. (भृगु ऋर्षीनी झोपलेल्या विष्णूला उठविण्यासाठी लाथ मारल्यावर विष्णूने त्यांना "आपल्या पायाला इजा तर झाली नाही ना?" असे नम्रपणे विचारल्यावर ऋषींनी प्रसन्न होऊन त्रिरत्न विष्णूला दिले असे म्हणतात, जे विष्णुने छातीवर धारण केले).
६. आजानुबाहू - गुडघ्यापर्यंत लांब हात असणे हे महापुरुषांचे लक्षण मानले गेले असल्यामुळे काही उभ्या मूर्तीमध्ये याचे शिल्पांकन केलेले दिसते.
७)  इंद्रिय निग्रह- हे लक्षण फक्त जैन मूर्तीमध्ये दिसते. ह्यामध्ये मूर्तीतील इंद्रिय अत्यंत लहान दाखवले जाते. इंद्रियविजयाचे ते लक्षण मानले जाते. बुद्ध प्रतिमेत वस्त्रे दाखविल्यामुळे हे लक्षण दिसत नाही.
     ही सर्वच्या सर्व महापुरुषाची लक्षणे साऱ्याच मूर्तीमध्ये दिसतात असे नाही. यातील तीनच गोष्टी या चटकन नजरेत भरणाऱ्या असतात. डोक्यावरील उष्णीष, लांब कान, आणि काही ठिकाणी उर्णा किवा त्रिरत्न, गुप्त काळापासून यामध्ये आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे अर्थोन्मिलीत डोळे अणि चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न असे मंद स्मित.

बुद्ध प्रतिमेच्या मुद्रा :-

     बुद्धाचे मूर्ती रूपातील शिल्पांकनात बसलेल्या स्थितीत कोरलेल्या मूर्तीमध्ये बुद्धाचे चारच प्रकार दिसतात आणि शिवाय झोपलेल्या अवस्थेत महानिर्वाण मुद्रा हा प्रकार दिसतो.
    १. ध्यान मुद्रा - या मुद्रेत भगवान बुद्ध हे ध्यान अवस्थेत दाखवलेले असून त्यांनी मांडी घातलेली असते. दोन्ही हात हे मांडीच्यामध्ये ठेवलेले असून एका तळव्यावर दुसरा तळवा ठेवलेला असतो.
    २. धर्मचक्र प्रवर्तन मुद्रा - ह्यामध्ये आसनावर बसलेल्या बुद्ध मूर्तीचे कधी मांडी घातलेली तर कधी पाय खाली सोडलेले असे शिल्पांकन असते. यामध्ये दोन्ही हात छातीजवळ असून दोन्ही बोटांचे पंजे एकमेकाला चिकटलेले परंतु बोटे फाकलेली असतात किंवा काही शिल्पांमध्ये फाकलेल्या बोटांपैकी उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा हा डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीवर दिसतो. धर्माच्या रुतलेल्या चाकाला मी गती देतो आहे या त्यांच्या संदेशाचे स्मरण यातून केले जाते.
    ३. प्रवचन मुद्रा- ही मुद्रा धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेप्रमाणेच असते. हातांच्या ठेवणीमध्ये त्यात थोडा फरक केलेला दिसतो. ज्यामध्ये डाव्या हाताची तीन किंवा चार बोटे अंगठ्याखाली मुडपलेली असून उजव्या हाताच्या मुठीने सुटी दोन बोटे किंवा करंगळी धरलेली असते. प्रवचन देताना धर्मतत्त्वांची बोटांवर मोजणी करतानाचे हे प्रतीक असते. या शिल्पामध्ये आसनाखाली हात जोडून बसलेले शिष्य आणि एक किंवा दोन हरिणे दिसतात. सारनाथ येथील पहिल्या प्रवचनाला काही हरिणेही तेथे येऊन बसली होती असे सांगतात म्हणून हा हरिणांचा समावेश बुद्ध मूर्तीच्या शिल्पांकनात दिसतो. याशिवाय बसलेल्या बुद्ध मूर्तीच्या खाली सिंह ही दाखवलेले असतात. हे सिंह त्यांच्या राजघराण्यातल्या जन्माची ओळख सांगतात.
    भगवान बुद्धांच्या शिल्पांकनामध्ये एकीकडे संन्यस्त जीवन आणि एकीकडे राजपुत्र याचे मिश्रण करावे लागले. कुरळे केस आणि सिंह हे त्यांच्या संन्यस्त वृत्तीच्या विरुद्ध स्वभावाचे होते तसेच अत्यंत रुंद खांद्यांचे सुदृढ शरीर आणि चेहऱ्यावर मात्र समाधिस्त योग्याचे भाव यावर फर्ग्यूसन नामक अभ्यासकाने छान टिप्पणी केली आहे. त्यांच्या मते हे शिल्पांकन म्हणजे अलंकार नसलेला राजा आणि स्मश्रू न केलेला संन्यासी. (In sculpture he is depicted as king without jewels, and a monk without tonsure.)
    ४. भूमिस्पर्श मुद्रा- गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली यावर तत्कालीन अनेक धुरिणांनी शंका घेतली. या प्रसंगाचे साक्षीदार कोण असे बुद्धांना वारंवार विचारण्यात येऊ लागले तेव्हा त्यांनी ही भूमीच माझी साक्षीदार आहे असे बसल्या बसल्या पटकन जमिनीला हात लावून म्हटले. नंतर गौतम बुद्धाची तपश्चर्या भंग करण्यासाठी मारानेही खूप प्रयत्न केले. परंतु ते सगळे विफल झाले. बुद्धाने आधीच्या जन्मात सात पारमिता पार केल्या होत्या याची साक्ष देण्यासाठी पृथ्वी आली. अशीही एक कथा या बद्दल सांगितली जाते. शिल्पांमध्ये ध्यान मुद्रेत मांडी घालून बसलेल्या बुद्ध मूर्तीचा डावा हात ठेवलेला असून उजव्या हाताने जमिनीला स्पर्श करताना दाखवले जाते.
     ५. महानिर्वाण मुद्रा- भगवान बुद्धांचा मृत्यू झाला त्या वेळेस त्यांच्या शेजारी त्यांचा आनंद शिष्य होता. शिल्पांमध्ये डोक्याखाली हात घेऊन उशीवर डोके ठेवलेली उजव्या किंवा डाव्या झोपलेल्या स्थितीमध्ये ही मूर्ती आढळते. निर्वाणासमयी भगवान बुद्धांचे वय जवळजवळ एंशी वर्षे असूनही या प्रकारच्या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा चेहरा मात्र तरुणच दाखवला जातो. याशिवाय भगवान बुद्धांच्या बसलेल्या किंवा उभ्या मूर्ती दिसतात, ज्यामध्ये उजवा हात अभय आणि डावा हात बरद मुद्रेत किंवा डाव्या हातात भिक्षापात्र घेतलेले दिसते.

अन्य बौद्ध देवता :-

     जसे हिंदूचे देव, त्यांचे अवतार आणि अनेक इतर प्रकार झाले, तसे बौद्ध पंथातही करणे आवश्यक झाले. भक्तिमार्गाच्या उदयानंतर वैचारिक स्तरावर आणि कलेतही जी घौडदौड सुरू झाली त्याला तसेच प्रत्युत्तर देणे हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आवश्यक झाले. बुद्धाचे चोवीस अवतार मानले गेले आहेत. हे भूतकाळाचे बुद्ध मानले जातात यातील शेवटच्या सातांना मानुषी बुद्ध म्हटले जाते आणि यातील आठव्या मानुषी बुद्धाला 'मैत्रेय' असे म्हटले जाते, जो पुन्हा भविष्यात बुद्ध होणार असे मानले जाते. याशिवाय बौध्द शिल्पांमध्ये अनेक देवींचीही शिल्पे दिसतात, ज्यांचे पंधरा प्रकार असून यातील मुख्यत्वे तारा आणि महामयुरी या देवींची शिल्पे सर्वाधिक दिसतात. याशिवाय धर्मपाल नावाचा एक देव समुदाय शिल्पात दिसतो, ज्यामध्ये कुबेर, यम, हयग्रीव, यमांतक वगैरे क्रुर तोंडाचे देव येतात.

बोधिसत्त्व - शिल्पकलेमध्ये हा अत्यंत लोकप्रिय असून लेण्यांमधील गर्भगृहाच्या बाहेरील द्वारपालांच्या जागेवर डावी उजवीकडे यांचे शिल्पांकन दिसते. हे बोधिसत्त्व सृष्टीचा व्यापार सांभाळतात आणि आपले कार्य पूर्ण करून निवृत्त होतात आणि आपल्या मूळ रूपात विलीन होतात. शिल्पांमध्ये दिसणारे प्रमुख बोधिसत्त्व म्हणजे वज्रपाणी, पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि मंजुश्री.

चित्र क्र. १३५ : बोधीसत्व, लेणे क्र. ६ वेरूळ
चित्र क्र. १३६ : तारा, लेणे क्र. ६, वेरूळ
चित्र क्र. १३७: महामयूरी, लेणे क्र. ६, वेरूळ

    वज्रपाणीच्या मूर्तीच्या हातामध्ये खड्ग किंवा अन्य शस्त्र असते. तर पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ धरलेले असते. अजिंठा येथील चित्रांमध्ये कमळ धरलेल्या पद्मपाणीचे चित्र दाखविले जाते. याचप्रमाणे या मूर्तीच्या जटामुकुटामध्ये कपाळावर छोटा स्तूप कोरलेला असल्यास तो मंजुश्री बोधिसत्त्व असतो आणि ज्याच्या कपाळावर ध्यानस्थ बुद्ध प्रतिमा असते तो अवलोकितेश्वर असतो.
   महामयुरी - कमळावर उभी असलेली ही देवी असून हिच्या शेजारी मोर काढलेला असतो. शिवाय हिच्या शेजारी अभ्यास करणारा एक विद्यार्थी देखील दिसतो. बौद्ध पंथात ही विद्येची देवता मानली जाते. वेरुळमधील बौद्ध लेण्यात (क्र. ६) हिचे पूर्णाकृती शिल्प आहे.
    तारा- कमळावर उभ्या असलेल्या ह्या देवतेच्या हातात लांब देठाची कमळाची कळी धरलेली असते. देशातील पूर्व भागात हिचे उग्र रूपही दिसते, ज्यामध्ये ती प्रेतावर उभी असलेली दाखविण्यात येते. कमळावर उभ्या असणाऱ्या तारेचे शिल्प वेरुळमध्येच वरील महामयुरीच्या शिल्पासमोरच दिसते.


१७. जैन प्रतिमा

चित्र क्र. १३८: महावीर, जैन लेणे, वेरूळ

महावीर :-

       गौतम बुद्धांच्याच समकालीन असणाऱ्या भगवान महावीरांचा जन्म बिहारमध्ये कुंडग्रामी झाला (इ.स. १५९९ ते ५२७). आजच्या पटना या शहरापासून सुमारे ४५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या वैशाली गावाजवळ हे गाव आहे. त्यांच्या पित्याचे नाव सिद्धार्थ आणि मातेचे नाव त्रिशला होते. सिध्दार्थ हा वैशाली गणराज्याचा राजा होता. भगवान महावीराचे नाव वर्धमान होते. वयाच्या तिसाव्या वर्षी त्याने गृहत्याग केला. सुरुवातीला त्याने अनेक गुरूंकडे राहून ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न केला परंतु त्याचे समाधान झाले नाही. जुंभक नावाच्या गावात त्याने १२ वर्षे कठोर उपासना केली आणि आत्मविजय मिळविला. पुढील जीवनामध्ये त्याने बाह्य शत्रूपेक्षा अंतर्गत शत्रूवरचा विजय हाच श्रेष्ठ आहे असा प्रचार केला. भगवान बुद्धाप्रमाणे त्याला नवीन पंथ स्थापन करावा लागला नाही. जैन पंथ हा त्याही आधीच्या प्राचीन काळापासून अस्तित्वात होता. वेद प्रामाण्य न मानणाऱ्यांचा हा पंथ होता. ज्याचा उल्लेख निगंठी  (म्हणजे वेद न मानणारे) असा केला जात असे.   केला.भगवान महावीरांच्या आधी या पंथाचे  २३ तीर्थकर (धर्मप्रमुख) होऊन गेले. महावीर हे या पंथांचे २४ वे तीर्थंकर होते. भगवान महावीरांचे योगदान दोन स्तरांवर होते. त्यांनी जैन पंथांमध्ये श्रमण संस्थेची प्रतिष्ठापना केली. ज्यामध्ये नवागत उपासकांपासून ते मुनीपर्यंत श्रेणी स्थापन केली. याशिवाय महिलांना आणि समाजातील सर्व स्तरांच्या लोकांना पंथात सामावून घेतले. त्यांचे स्वतःचे जीवन हे अत्यंत कर्मठ असल्यामुळे तीच वृती अनुयायांमध्ये आणि पंथांमध्ये आचरणात राहिली. त्यांचे दूसरे योगदान हे वैचारिक राहिलेले आहे. त्यांनी  अहिंसा ही अत्यंत आग्रहाने सांगितली आणि तीसुद्धा इतक्या पराकोटीची की सुक्ष्म जंतुंची देखील हत्या निषिद्ध ठरवली. इतकेच नाही तर जिवंत वनस्पती किंवा त्यापासून बनवलेली उत्पादनेही निषिद्ध ठरवली. याचबरोबर सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य याही बाबतीत ते भयंकर आग्रही होते तसेच सर्व उपासकांनीही असावे असा त्यांचा कटाक्ष आणि आग्रह होता. परंतु भगवान महावीरांनी सगळ्यात मोठे योगदान हे त्यांच्या पाचव्या तत्त्वामध्ये त्यांनी सांगितले ते म्हणजे अपरिग्रह, याचा अर्थ काटकसरीने जीवन जगणे. स्वतःसाठी किंवा कुटुंब पोषणासाठी आवश्यक तेवढाच धनधान्न जो इतर चीज वस्तूंचा संग्रह करावा यापेक्षा अधिक एका टाचणीचाही मोह किंवा संग्रह असतां कामा नये. तसेच विलासी आणि सुखासीन जीवनाची लालसा ठेवू नये.
    अपरिग्रह हा जरी त्यांनी जैन पंथांच्या लोकांसाठी सांगितला असला तरी तो इतका व्यवहारी होता आणि त्याबरोबरच संयमित जीवन आचरणात आणण्यासाठी आवश्यक असा मार्गदर्शक संदेश होता की, ज्यामुळे संपूर्ण भारतातल्या सर्व समाजावर त्याचा प्रभाव पडला. ज्याचा परिणामस्वरुप आपल्या देशांमधील मोठ्या प्रमाणात असणारा एक गट ज्याला आर्थिक दृष्ट्या मध्यम वर्ग असे म्हणतात. तो समाज आपले उत्पन्न पाहून त्याप्रमाणे सीमित व्यय करू लागला. इतकेच नव्हे तर सतत अनावश्यक खर्च टाळण्याचे प्रयत्न करत राहिल्यामुळे आजही सर्व स्तरांमध्ये थोडीफार बचत केल्याचे दिसते. जगातील अन्य देशातही असे आर्थिक गट असले तरी ही बचतीची भारतीय सवय त्यांच्यात दिसत नाही. आधुनिक जगाच्या प्रचंड आर्थिक उलथापालर्थीमध्ये अनेक देश लयाला जाताना दिसत आहेत, परंतु भारत मात्र त्या धक्क्यांमध्येही तग धरून राहिलेला दिसतो. शतकानुशतके साधी राहणी आणि बचत करण्याची सवय याचे श्रेय महावीराना द्यावे लागेल. अपरिग्रहाचा संदेश आधुनिक काळामध्ये मात्र विस्मरणात दिसतो. तर जैन बधूच्या आचरणात त्याचा लवलेशही दिसत नाही. असे असूनही सढळ हस्ते दान करावे या भगवान महावीरांच्या शिकवणीचे मात्र पालन करण्याची अधुनिक काळातही दिसते. आजही लोककल्याणकारी कामांसाठी सर्वात मोठी दाने ही जैन समाजातील लोकांकडूनच येताना दिसतात. भगवान महावीरांनंतर हजारो वर्ष अव्याहतपणे हा पंथ आपले अस्तित्व टिकवून आहे याचे सर्व श्रेय भगवान महावीरांना जाते.
चित्र क्र. १३९ : पार्श्वनाथ, जैन लेणे, खेरूज
 
   शिल्पकलेप्रमाणे जैन शिल्पकला ही प्राचीन आहे. अनेक राजे त्या वेळेस जैन पंथाचा स्विकार करत होते. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकात ओडीशा प्रांतात खारवेल नावाच्या राजाचे राज्य होते. उदयगिरी आणि खंडगिरी येथे त्या काळातील जैन लेणी आपल्याला आढळतात, भगवान महावीरांनीही त्यांची शरीर किंवा मूर्तिरूपात पूजा करू नये असे सांगितले होते. त्यामुळे त्या प्राचीन लेण्यांमध्ये भगवान महावीरही प्रतीकात्मक रूपात दिसत. इ.स.च्या सातव्या आठव्या शतकानंतर बौद्ध धर्माचा र्हास झाला. त्या वेळेस जैन पंथ सावध झाला. बौद्धांनी केलेल्या चुका त्यांनी कटाक्षाने टाळल्या. जैन आचरण तर निर्दोष होतेच परंतु बौद्धांप्रमाणे त्यांनी जनसंपर्कही तुटू दिला नाही. भक्तिमार्गाच्या मुळे हिंदू देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात घडू लागल्यामुळे जैनांनाही त्या स्पर्धेमध्ये उतरावे लेगी कोरण्याबरोबरच हिंदूप्रमाणे दगडातील मंदिरेही बांधण्यास त्यांनी सुरुवात केली ज्यामध्ये भगवान महावीरांसकट अन्य तीर्थंकर आणि इतर देवदेवतांच्या मूर्तीही बसविण्यात येऊ लागल्या.
 जैन पंथाला दुहीचा शाप मात्र आधीच लागला होता. या विभिन्न देवदेवतांच्यामुळे त्याच्यात भर पडली. याची सुरुवात झाली होती ती सम्राट चंद्रगुप्ताच्या कालखंडात. चाणक्याने राज्य स्थापन करून दिल्यानंतर चंद्रगुप्ताने ते इ.स.पू. ३०० पर्यंत चालवले. परंतु त्याच्या अंतिम काळात बारा वर्ष सलग दुष्काळ पडला. त्या वेळेस मगध राज्यातील जैन मुनी जे केवळ भिक्षेवर जगत त्यांचे जगणे तिथे कठीण झाले म्हणून त्यांना दक्षिण भारताकडे जावे लागले. दिगंबर अवस्थेतील जैन मुनी है मगधमध्ये परीचित होते. परंतु दक्षिण भारतात मात्र समाजाने त्यांना स्वीकारले नाही. अखेर तडजोड करुन त्यांनी केवळ कमरेभोवती एक श्वेत वस्त्र गुंडाळायला सुरुवात केली. दुष्काळ संपल्यावर जेव्हा हे जैन मुनी मगध मध्ये परत आले तेव्हा तेथील जैन संघानी त्यांना स्वीकारण्यास नकार दिला. यातुन प्रथम दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन पंथ जैन संघात झाले. पुढे यामध्ये भरच पडत गेली. अनेक उपपंथ आणि उपशाखा अस्तित्वात आल्या. या सर्वांची स्वतंत्र देवालये आणि अन्य शिल्पेही अस्तित्वात आली. त्यामुळे दहाव्या शतकानंतर बांधल्या गेलेल्या अनेक जैन मंदीरामध्ये असंख्य प्रकारच्या देव प्रतिमा दिसतात. त्यांचे अत्यंत क्लिष्ट वर्गीकरण आणि नामांकन मूळे त्यांची ओळख पटणेही कठीण होऊन जाते. इतकेच नाही तर यामध्ये अनेक हिंदू देवदेवतांच्या प्रतिमांचाही थोडे फार फरक करून समावेश केलेला दिसतो. तर काही ठिकाणी सुरसुंदरी, नर्तकी आणि नायिकांचेही शिल्पांकन आढळून येते.

  जैन शिल्पकला :-

     जैन शिल्पकलेमध्ये सर्वात प्रमुख शिल्पांकन हे भगवान महावीर आणि इतर तीर्थंकरांचे असते. यांच्या शारीररूपातील मूर्ती बौद्ध मूर्तीप्रमाणेच असून त्यामध्ये काही ठिकाणी उष्णीष तर काही ठिकाणी केवळ केशविहीन डोके असते. लांब कान, ऊर्णा, श्रीवत्स आणि आजानुबाहू ही लक्षणे त्यात दिसतात. तर उभ्या मूर्तीमध्ये दिगंबर

चित्र क्र. १४० : बाहुबली, जैन लेणे, वेरुळ

मूर्ती असल्यामुळे सातवे महापुरुष लक्षणही दिसते (पाहा महापुरुष लक्षणे - बुद्ध मूर्ती), भगवान महावीरांच्या किंवा तीर्थंकरांच्या सर्वतोभद्र मुर्ती दिसतात. एकाच दगडात कोरलेल्या ज्यामध्ये चारही बाजूंना एकमेकांकडे पाठ केलेल्या चार मूर्तींचे संयुक्त शिल्प असते. महामायेच्या स्वप्नाप्रमाणे भगवान महावीरांच्या आईलाही हत्ती स्वप्नात दिसल्याचे शिल्प आढळते.

वेरुळमधील जैन प्रतिमा :-

    वेरुळची जैन लेणी (इ.स. ९-१० शतक) दिगंबर पंथियांची असून त्यात महावीर, पार्श्वनाथ, गोमटेश्वर (बाहुबली), मातंग आणि सिद्धाविका अनेक शिल्पे दिसतात. यातील लेणी क्र. ३२ इंद्रसभा असे म्हटले जाते. 
चित्र क्र. १४१ : सिद्धायिका, जैन लेणे, वेरूळ

       त्याच्या वरच्या मजल्यावर सिंहावर बसलेली सिद्धायिकेची भव्य मूर्ती आहे. तिच्याजवळ तिचे मूल असते. ते तिच्या बसलेले असून तिच्यामागे आम्रफळांनी बहरलेला वृक्ष, त्यावरील पक्षी आणि माकडेही आहेत. देगलूरकरांच्या मते, "इतकी सुरेख प्रतिमा अन्यत्र क्वचित पाहायला मिळते. कुरळ्या कपाळावरील महिरप धनुष्याकृती भुवया, सरळ धारदार नाक, कोमल ओठ, आकर्षक हनुवटी, शंखाकृती गळा, गोल व डौलदार खांदे, मृग स्तन, नितळ पोट, गजशुंडवत निमुळत्या मांड्या- यामुळे ती यक्षिणी असू शकते. सामान्य स्त्री नव्हे याची खात्री पटते' (देगलूरकर : २००८). समोरील कोनाड्यामध्ये हत्तीवर बसलेल्या मातंग या जैन देवतेचे असेच भव्य शिल्प आहे. त्याच्या मागे वडाचे झाड आहे. हा देव हत्तीवर आरूढ असल्यामुळे याला चुकून इंद्र समजले गेले. लेणीचे नाव इंद्रसभा असे दिले गेले.
 याच्या शेजारील लेणीमध्ये मुख्य गर्भगृहात भगवान महावीरांची मूर्ती असून गर्भगृहाच्या बाहेर पार्श्वनाथ आणि बाहुबली यांच्या उभ्या मोठ्या प्रतिमा आहेत. पार्श्वनाथाचे शिल्प ओळखण्यास सोपे असते. कारण त्यांच्या मागे डोक्यावर पाच किंवा सात फण्यांचा नाग कोरलेला असतो आणि त्याच्याभोवती यक्ष आणि शासन देवी असतात. याशिवाय काही भक्तही दिसतात. बाहुबलीच्या शिल्पाची ओळख ही त्याच्या दोन्ही मांड्यांभोवती आणि हाताभोवती असणाऱ्या वेलींवरून होते. त्याने इतकी वर्षे साधना केली की त्याचे शरीर वृक्ष वेलींनी वेढले गेले. या शिल्पाच्या खालच्या बाजूला अनेक प्राणी काढलेले आहेत. बाहुबलीच्या पायाशी एक मुंगुस कोरलेला असून त्याच्या शेजारी एक सापही काढलेला आहे. बाहुबलीचा प्रभाव असा की हे दोन जन्मजात शत्रू आपले हिंसात्मक स्वभाव सोडून एकमेकांशेजारी सलोख्याने नांदत आहेत. बाहुबलीचे सर्वात मोठे शिल्प कर्नाटक मधील श्रवणबेळगोळ येथे आहे. जवळजवळ ५० फूट उंचीचे हे शिल्प गोमटेश्वर या नावानेही प्रसिद्ध आहे.

क्र. १४२ मतंग, जैन लेणे. वेरूळ

मंदिरे :-

     जैन मंदिरे- संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी जैन आढळतात. यातील काही ठिकाणे ही स्थानमाहात्म्यामुळे अधिक प्रचलित झाल्यामुळे तेथे अनेक नव्या मंदिराचेही बांधकाम झालेले आढळते. उदा., पालिताना (गुजरात) येथील मंदिर समूह. भारतातील प्रसिद्ध जैन मंदिरामध्ये राजस्थानमध्ये माउंट अबू येथील दिलवाडा मंदिर, गुजरातमधील तारंगा येथील अजितनाथाचे मंदीर आणि खजुराहोमधील जैन मंदिरे यांचा समावेश प्रामुख्याने होतो. दिलवाडा आणि राणकपुरच्या मंदिरातील शिल्पकला ही संगमरवरी दगडात केली असून दिलवाड्यातल्या कोरीव कामाची जगप्रसिद्ध आहे. तारंगा (गुजरात) येथील मंदिर हे १०-११ व्या शतकातील असून त्याची उंची १०७ फुटाहून अधिक आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर शेकडो शिल्प असून जैन शिल्प कलेतील देवीदेवतांचे अनेक प्रकार तर येथे दिसतातच परंतु काही अन्य विशेष शिल्पेही येथे आहेत. यामध्ये भुजंगत्रासित अभिसारिकेच्या शिल्पाचा उल्लेख करावा लागेल. प्रियकराला भेटायला निघाली असताना सापाची सळसळ ऐकू आल्यामुळे घाबरून तिने तिचा डावा पाय उचललेला असून भेदरलेल्या नजरेने ती त्या सापाच्या दिशेने पाहत आहे. या प्रकारच्या अभिसारिकेचे हे अत्यंत दुर्मिळ शिल्प येथे दिसते.

चित्र क्र. १४३: जैन मंदिर, तारंगा, गुजरात

खजुराहोमधील जैन मंदिरापैकी आदित्यनाथाचे मंदिर हे आधीचे हिंदू मंदिर असावे असे वा कारण त्याच्या बाहेरील मूर्तिकामामध्ये सर्व हिंदू देवदेवतांच्याच मूर्तीचे शिल्पांकन आहे. शेजारील पार्श्वनाथाच्या मंदिरांवर शिल्पांकन खजुराहोच्या अन्य मंदिराप्रमाणे असून त्यात अनेक देवदेवी दिसतात. या दोन्ही मंदिरांवर कामशिल्पे मात्र अजिबात नाहीत. पायातील घुंगरू बांधणार्या नर्तकीचे खजुराहोमधील प्रसिद्ध शिल्प आदित्यनाथाच्या मंदिराच्या उत्तर भिंतीवर आहे.


१८. सुरसुंदरी (भाग १)


क्र. १४४: डालमालिका, खजुराहो

     प्राचीन मंदिरात आपल्याला देवातांच्याच एव्हढ्या संख्येनी आणि त्याच आकारमानाची अनेक शिल्पेही दिसतात. त्यामध्ये सप्तमातृकांव्यतिरिक्त योगिनी, कंदुक क्रीडा करणाऱ्या, सापाशी खेळणार्या किंवा सापाच्या वेटोळे अंगावर असणाऱ्या, माकड, मुंगुस, पोपट, मोर इत्यादी प्राणी किंवा पक्षी यांच्यासह असणाऱ्या, तसेच विविध भावमुद्रांमध्ये उभ्या असलेल्या स्त्रियांची अनेक शिल्पे आतात. या पैकी वादन करणाऱ्या स्त्रीशिल्पांना मर्दला असे म्हणतात. नृत्यमग्न शिल्पे नर्तकींची असून अनेकदा मरतमुनीच्या नाट्यशास्त्रात ज्यांना 'करण' म्हणतात त्या नृत्यमुद्रांमध्ये त्या कोरलेल्या असतात.  (दाते: २०१०,३९) याशिवाय ज्या आणखी एक प्रकारच्या स्त्रीयांचे शिल्यांकन आढळते ज्यांना सुरसुंदरी म्हटले जाते.
  सुरसुंदरी म्हणजे अप्सरा किंवा पऱ्या असा समज आहे. शिल्पशास्त्राच्या ग्रंथांमध्येही यांच्यावर थोडे लिखाण झाल्याचे आढळते. शिल्पप्रकाश, क्षीरार्णव अशा ग्रंथात यांचे अनुक्रमे १६ आणि ३२ प्रकार सांगिलते आहेत. आपल्यातील विकार नाहीसे व्हावेत, त्यांचे दमन व्हावे, जीवनदृष्टी निर्मल व्हावी तसेच आपल्या तत्त्वज्ञानातल्या काही गोष्टी सूचकपणे सांगण्याच्या उद्देशाने यांचे शिल्पांकन केलेले असते. ( देगलूरकरः २००४, पृ. ५-६) सगळ्याच मंदिरातील शिल्पांमध्ये त्या असतात असे नाही. वेरुळमध्ये तर त्यापैकी एकही आढळत नाही तर खजुराहो येथील मंदिरात त्या शेकड्याने कोरलेल्या आहेत. परंतु सर्वसाधारणपणे दहाव्या शतकानंतर बांधलेल्या मंदिरात त्या ठळकपणे दिसतात. काही वैशिष्ट्यपूर्ण सुरसुंदरींचे प्रकार आणि सामान्यतः अनेक मंदिरात दिसणारी त्यांची शिल्पे खालीलप्रमाणे आहेत.

      शुभगामिनी- 

डाव्या पायावर तोल सावरत उजवा पाय समोरच्या बाजूला उचलून त्याच्या तळव्यातील काटा काढणाऱ्या तरुणीचे हे शिल्प असते. मंदिरामध्ये आपण आलो आहोत हे अंततोगत्वा त्या गर्भगृहातील देवाशी एकरूप होण्यासाठी म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी. इथे एकदा येऊन चालत नाही तर पुन्हा पुन्हा यावे लागते. ही साधना अखंड चालू ठेवावी लागते. स्वाभाविकपणे यात अनेक अडचणी येतात कारण हा साधनेचा मार्ग आहे. या मार्गावर असंख्य काटे पसरलेले असतात. या सुरसुंदरीला सुचवायचे हे असते की हा मार्ग जरी कंटकांनी भरलेला असला तरी, हे काटे अलगदपणे काढून टाकत साधकाने मार्गक्रमण चालूच ठेवायचे असते. या सुरसुंदरीला 'शुभगामिनी' असे म्हणतात.
 
चित्र क्र. १४५ : शुभगामिनी, खजुराहो

 जया, पद्मगंधा आणि डालमलिका - 

  मंदिराच्या द्वारशाखेशेजारी असणारी ही शिल्पे आहेत. देवळात जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये असे त्या सुचवितात. झाडाची पाने, फुले, फळे किंवा पाणी यापैकी काहीही मला वाहिलेले चालते असे भगवंताने म्हटलेले आहे.
         पत्रं पुष्यं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
         तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥२६॥   (भगवद्‌गीता ९-२६)
       मंदिरात जाताना देवासाठी काहीतरी घेऊन गेले पाहिजे. धन किंवा अन्य नैवैद्य नसेल तर फळे किंवा फुलेसुद्धा चालतात याची आठवण करून देणारी सुरसुंदरी  म्हणजे डालमलिका.

चित्र क्र. १४६ : डालमलिका, खजुराहो
 उजवा हात उचलून ती झाडावरून पाने तोडताना किंवा फुले काढताना शिल्पात दिसते. ज्या सुरसुंदरीच्या हातामध्ये कमळाचे फूल किंवा कळी असते तिला 'पद्मगंधा' म्हणतात आणि जिच्या हातात पोटाजवळ किया एका हाताने खांद्याजवळ घरलेला कलश असतो तिला 'जया' असे म्हणतात.

क्र. १४७ : आलसकन्या, खजुराहो

आलसिका किंवा आलस कन्या- 

     सकाळी उठल्यावर आळस झटकण्यासाठी डोक्यावर दोन्ही हात धरून त्यावर ताण देऊन संपूर्ण शरीराला आळोखेपिळोखे देणाऱ्या युवतीचे हे शिल्प असते. अनेक मंदिरावर हे ठळकपणे दिसते. पुढून, मागून, बाजूने, अर्धवट वळलेले, पूर्ण वळलेले अशा अनेक वेगवेगळ्या स्थिर्तीमध्ये याचे शिल्पांकन दिसते. या शिल्पांकनामध्ये विशेषतः आधीच कमनीय असलेल्या स्त्री देहाच्या पुर्ण आणि उठावदार असणाऱ्या बाह्य रेषांचे मनोहारी दर्शन होते. मंदीरावर हे कोरण्याचा हेतू असा की देवकार्यासाठी सदैव आळस सोडून तत्पर असले पाहिजे.


चित्र क्र. १४८: मरीचिका, खिद्रापूर

       मरीचिका-

     हातात धनुष्य बाण घेतलेल्या स्त्रीचे हे शिल्पांकन असते. खिद्रापूरच्या मंदिरामध्ये मरीचिकेचे सर्वोत्तम शिल्प आहे. डावा हात डोक्यावर सरळ उचललेला असून त्यात तिने धनुष्य धरले आहे, उजवा हात कोपरात वाकला असून प्रत्यंचेच्या खाली आहे. नुकताच तीने बाण सोडल्याचे ते निदर्शक आहे. त्वेषाने बाण सोडल्याच्या या कृतीनंतर तोल सावरायला क्षणभर तिने तिचा उजवा पाय डाव्या पायाच्या उचलून धरलेला दिसतो. या शिल्पांकनामध्ये तिचा डावा दिसत असून एका बाजूला तिचा चेहरा आणि बाण सोडलेल्या गेलाच्या धक्क्याने उसळलेल्या तिच्या वक्षाची गोलाई एकीकडे तर दुसरीकडे यालाच अनुरूप तिची पाठ आणि नितंबाचा गोलाकार दाखवून कलाकाराने अप्रतिम संतुलन साधले आहे. डॉ. देगलूरकरांच्या मते तिला जणूकाही तिच्या बाणाने अज्ञान अंध:काराचा नाश करायचा आहे. (देगलूरकर: २०१३, पृ.५८).

चित्र क्र. १४९ : पुत्रवल्लभा, खजुराहो

     पुत्रवल्लभा - 

   लेकुरवाळ्या स्त्रियांचे शिल्पांकन हेही अनेक ठिकाणी दिसते. एक, दोन, किंवा तीन मुलेही असणारी त्यापैकी एखादे मूल कडेवर घेतलेले असेही शिल्प असते. कडेवरच्या मुलाशी खेळताना दिसते किंवा मुलाला कमरेत धरून दोन्ही हात डोक्याचा सरळ धरून तिने बाळाला वर धरलेले असते.

      माकड आणि स्त्री- 

    माकड आणि स्त्री हा विषयसुद्धा अनेक देवळातील शिल्पांमध्ये दिसतो. या शिल्पांत पुरुषाचे मन सदैव चंचल असते हे दाखविण्यासाठी माकड हे रूपक वापरले आहे. देवळात गेल्यावरही मनाच्या मर्कटचेष्टा सुरूच असतात. त्यामुळे अशा शिल्पांमध्ये अनेक वेळा त्या माकडावर हात उगारून त्याला ती स्त्री गप्प राहायला सांगत असताना दिसते. या मुद्रेला 'चपेटदान मुद्रा' असे म्हणतात. हे मनाचे माकड असे स्वस्थ बसत नाही तर देवळात आपल्याशिवाय आणखी कोणकोण आले आहे ते न्याहाळायची एक मनोवृत्ती असते. तसेच पुरुषांची नजर वाईट (कावळ्यासारखी) असे म्हणतात. बहुतांश शिल्पांमध्ये ते माकड स्त्रीच्या मांडीवर चढलेले असते आणि तिचे वस्त्र ओढत असते. अनेक शिल्पांमध्ये ते वस्त्र ओढत ते गुडघ्याचाही खाली ओढले गेलेले असते. यामुळे या शिल्पामध्ये स्त्री विवस्त्र अवस्थेत दिसते. खिद्रापूर, खजुराहो, रानी की वाव, पानगाव, धर्मापुरी, ओडिशा येथील अनेक मंदिरांमध्ये हे शिल्प अनेक ठिकाणी दिसते. पुरुषाच्या मनासाठी माकडाचा रूपक म्हणून वापर करणे ही तर कलाकारांची प्रतिभा असतेच परंतु एका मोठ्या विकाराचे, विशेषतः पुरुषांमध्ये असणाऱ्या विकाराचे दर्शन यातून घडते. पानगावच्या (जि. लातूर) मंदिरातील एक तिने हात माकडावर उगारलेला असून वस्त्र घसरू नये म्हणून उजवा पाय उचललेला आहे. मनावर सतत नियंत्रण ठेवावे यासाठी याहून सूचक असे शिल्प ते काय असणार.

चित्र क्र. १५०: माकड आणि सी, रानी की बाव, पाटन

  या मालिकेतील अत्यंत कल्पक शिल्प खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरात पाहायला मिळते. एका पुरुषाच्या हातात एक काठी आहे, जिचे समोरचे टोक आकड्यासारखे वाकलेले आहे. त्याच्या कुटील मनाचे ते सूचक आहे. त्या वाकड्या टोकाला प्रलोभन समजून त्याच्याशी ते माकड खेळते आहे. माकडाला घाबरून एक तरुणी त्याच्या जवळ आली आहे. ती थोड्या भीतियुक्त कुतूहलाने माकडाकडे पाहाते आहे. आयत्या हातात आलेल्या संधीचा फायदा घेत त्या पुरुषाने डाव्या हाताने तिच्या कमरेला विळखा घातला आहे. हे शठ नायकाचे शिल्पांकन असून कलाकाराने त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर अत्यंत , मिस्कील भाव दाखवलेले आहेत.

चित्र क्र. १५१ : माकड आणि पुरुष खजुराहो

 १९. नायिका


चित्र क्र. १५२ : दर्पणा, खजुराहो
 






 






















      मंदिरावरील शिल्पांमध्ये ज्ञान, विज्ञान (इथे विज्ञानाची व्याप्ती ही ब्रह्मांडशास्त्र या विषयापुरतीच निगडीत आहे), तत्त्वज्ञान यावर आधारित शिल्पांमधून आपल्या देशातील श्रेष्ठ ज्ञान परंपरेचे जतन कसे केले गेले हे आपल्याला कळते तसेच त्या ज्ञानाची व्याप्ती आणि प्रगल्भताही कलाकारांच्या तपश्चर्येतून साकार झालेली दिसते.
   ज्ञानशाखांइतकीच साहित्याची देखील एक अत्यंत समृद्ध परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे, ज्यामध्ये कथा, काव्य आणि नाट्य यांचे देखील विपुल लेखन झालेले दिसते.
  या समृद्ध साहित्य परंपरेचे शिल्पांकन मंदिरावरील सर्वस्पर्शी शिल्पकलेत न दिसते तरच नवल वाटले असते. अगदी प्राचीन लोकसाहित्यापासून ते संस्कृतमधील अभिजात साहित्यात प्रेम, बिरह आणि पुनर्मीलन हे कथानकाचे आधारभूत स्तंभ राहिले आहेत. याशिवाय यामध्ये खलनायक, विदूषक, दूत किंवा दूती अशा पात्रांचाही भरणा असतो. यामध्ये नायक जरी कथेचा केंद्रबिंदू असता तरी नायिकेच्या भावभावनांना अधिक महत्त्व दिलेले दिसते. नायिकांप्रमाणे नायकांच्याही प्रकारांचे वर्णन केलेले आढळते. वात्स्यायनाने नायकाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये शश, वृष आणि अश्व यांचा समावेश होतो. परंतु हे त्यांच्या स्वभाव विशेषांप्रमाणे नसावे असे वाटते, नागरिक था अर्थाने नायक असल्यास त्याचे तीन प्रकार सांगितले आहेत. उत्तम, मध्यम आणि नीच. त्यांच्या गुणांप्रमाणे त्यांचे त्याने वर्गीकरण केलेले आहे आणि त्यातील उत्तम नायक म्हणजे जो कुशल, विद्वान तसाच सदव्यवहारी आहे. त्याला ६४ कलांचे ज्ञान आहे आणि ज्याच्या गुणामुळे त्याच्यावर स्त्रिया भाळतात. पुढील साहित्यात हरिहर याच्या मते भद्र, दत्त, चुमार आणि पांचाल हे नायकांचे चार प्रकार सांगितले आहेत. या वर्णनामुळे कथेमधील नायक हा बरेच वेळेला धीरगंभीर किंवा धीरउदात असाच रंगवला जाई. परंतु याशिवाय स्त्रीला वश करण्यासाठी अनेक खोट्यानाट्या युक्त्या किंवा प्रसंगी थोडे कपटही करणाऱ्या नायकाला शठ नायक म्हणत. (वाकड्या काठीने माकडाशी चाळे करणारा) नायकांच्या प्रकारांमध्ये पती, उपत्ती, वैषिक हे प्रकार दिसतात, तर त्यांच्या स्वभावानुसार दक्षिण, भ्रष्टा (धूर्त), शठ (प्रच्छन्न, प्रकाश), मानिन, चतुर (वाकःचातुर, क्रियाचातुर) असे नायकांचे प्रकार आढळतात. याशिवाय त्यांच्या काही अवस्थांचे वर्णन केले आहे. त्या म्हणजे प्रोषित, आमिलीत, विरहीन इ. नायकांबरोबरच त्यांच्या साहाय्यकांचेही वर्णन दिसते. कथेमध्ये आणि रंगमंचावर ही पात्रे सूत्रधार, विदूषक किंवा सेवक अशा भूमिकांमध्ये वावरतात. तर अनेक वेळा प्रमुख शिल्पाच्या खालील आकृतीत हे साहाय्यक म्हणून दिसतात. ह्यांचे पीठमर्द, विट, चेट आणि विदूषक असे चार प्रकार सांगितले आहेत. तसेच नायकांच्या मानसिकतेप्रमाणे एक वर्गीकरण दिसते ज्याचे चार प्रकार श्रावणानुरागी, दर्शनानुरागी, चित्रानुरागी आणि स्वप्नानुरागी हे होत (राय: १९८३).
  यातील अनेक नायक त्यांच्या ह्या वैशिष्ट्यांसह शिल्पांमध्ये दिसतात. परंतु कथा कादंबऱ्यांमध्ये शब्दात वर्णन केले असल्यामुळे ते पात्र आपल्या डोळ्यासमोर सहज उभे राहते. शिल्पकलेत मात्र हे सर्व ज्ञात असले तरी दर्शकांना शिल्पातील नायक किंवा नायिका कुठल्या भावमुद्रेत किंवा भूमिकेत आहेत हे हुडकून काढावे लागते.
   स्वभावाप्रमाणे वात्स्यायनाने नायिकांचे तीन भेद सांगितले आहेत. ज्यामध्ये मृगी, बडवा आणि हस्तिनी यांचा समावेश आहे. मृगी ही अत्यंत भावनाप्रधान असते, ती प्रेमकुशल असून मत्सराला भिणारी असते. बडवा ही गोड आवाजाची, सहानुभूत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची असते. मत्सराचे भय तिलाही असते. हस्तिनी ही बडबडी, रागीट आणि अत्यंत आतल्या गाठीची असते. वात्स्यायनाने त्यांच्या शरीर भेदाप्रमाणेही वर्गीकरण केलेले आहे. ज्यामध्ये पद्मिनी, चित्रिणी, शंखिनी आणि हस्तिनी यांचा समावेश होतो. परंतु ही वर्णने त्यांच्या शारीरिक अवस्थांची वाटतात. कथेमधील भूमिके अनुसार किंवा विशिष्ट प्रसंगी होणाऱ्या मानसिक अवस्थेप्रमाणे जो स्त्री मनाचा वेध घेतला गेलेला आहे, त्या वर्गीकरणाला अष्टनायिका असे सर्व साधारणपणे संबोधले जाते. यांचाही उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये दिसतो. वात्स्यायनाचे कामसूत्र, अनंगरंग, नगरसर्वस्व, रतिमंजरी, रतिरत्न, प्रदीपिका, रतिरहस्य, समर दीपिका हे सगळे कामशास्त्रावरील ग्रंथ असले तरीही त्यातही नाविकांची वर्णने आणि नायिकाभेद सविस्तरपणे दिलेले आढळतात. शृंगाररसप्रबंध दीपिका तसेच कालिदासाचे रघुवंश, मेघदूत आणि  शाकुंतल यामध्ये या नायिकांची नावे. त्यांचे प्रकार आणि उपप्रकारांची तपशीलवार वर्णने आढळतात.
    आठ प्रमुख नायिका, दोन उपनायिका आणि त्यांचे विविध प्रकार यातून या नायिकांचे पाचशे अधिक प्रकार होऊ शकतात.

नायिका आणि त्यांचे भेद :-

   साधारणतः अष्टनायिका म्हणजे नायिकांचे आठ प्रकार हे सर्वांना परिचित किंवा ऐकून माहिले असतात. प्राचीन साहित्यात मात्र त्यांचे फारच खोलात जाऊन वर्गीकरण केले गेले होते असे आढळते राम कुमार राय यांनी नायिकांचे ९ प्रमुख प्रकार सांगितले असून त्यांनी त्यांचे तपशिलात पृथक्करण करून त्यांचे विस्तृत वर्गीकरणही केले आहे. यांच्या मते ते वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.
प्रमुख प्रकार                 उप प्रकार
१. स्वाधीनपतिका :     १. दूतीवंचिका २. भाविशंकिता
२. वासकसज्जिका :    १. अवसितप्रवासपतिका
३. विरहोत्कंठिता:       १. कार्यविलंबिता (५ प्रकार) दर्शन अनुतापिता, श्रवण-अनुतापिता, चित्र- अनुतापिता, स्वप्न अनुतापिता आणि
                               अनुत्पन्न -  संभोग
४. विप्रलब्धा :           १. नायकवंचिता २. सखीवंचिता
५. खंडिता :               १. मानावती (३ प्रकार) गुरुमाना, मध्यमाना, लघुमाना २. धीरा ३. अधारा ४, धीराधीरा ५ अन्यसंभोगदुःखिता (४
                                 प्रकार) दूतीसंभोगदुःखिता, दूतीसमासक्तिदुःखिता, इतररतिश्रुतिखिन्ना, ईर्ष्यागर्विता
६. कलहान्तरिता :      १. ईर्ष्याकलहान्तरिता २. प्रणयकलहान्तरिता
७. वक्रोक्तिगर्विता :     १. प्रेमगर्विता २. सौंदर्यगर्विता (४ प्रकार) स्मितगर्विता, यौवनगर्विता, सौकुमार्यगर्विता, विलासगर्विता ३.  
                                सौभाग्यगर्विता, ४. नैपुण्यगर्विता
८. प्रोषितभर्तृका :     १. प्रवस्थपतिका (१ प्रकार) विगलितप्रस्थानपतिका २. प्रवसतपतिका ३. प्रोषितापतिका (१ प्रकार) सख्यनुतापिता
९. अभिसारिका : १. ज्योत्स्ना अभिसारिका २. तमो अभिसारिका ३. दिवा अभिसारिका ४. गर्व अभिसारिका ५. काम अभिसारिका ६. प्रेमवाक्य अभिसारिका

         वरील सर्व प्रकारच्या नायिकांचे त्यांच्या वर्तणुकीनुसार उत्तमा, मध्यमा आणि अधमा असे ३ प्रकार असतात. उत्तमा म्हणजे शालीन, मध्यमा म्हणजे थोडी मोकळी आणि अधमा म्हणजे उत्तान आणि उच्छृंखल अशी नायिका. तसेच या नायिकात, स्वीया, परकीया आणि सामान्या असे ३ उपप्रकार असतात, स्वीया ही पत्नीच असते तर परकीया ही प्रेयसी किंवा अन्य कुणाची पत्नी असु शकते. सामान्या म्हणजे गाव भवानी. या उपप्रकारच्या नायिकांचेही वर्गीकरण केले गेले हैं खालीलप्रमाणेः

स्वीया नायिका (३ प्रकार) १. मुग्धा, २. मध्या आणि ३. प्रगल्भा. त्याशिवाय या सर्वांचे ज्येष्ठा आणि कनिष्ठा है दोन प्रकार असतात.
मुग्धा नायिका (२ प्रकार) १. ज्ञातयौवना २. अज्ञातयौवना (२ प्रकार नवोढा आणि विश्रब्धा)
 मध्या नायिका : (२ प्रकार) १. प्रच्छन्नमध्या २. प्रकाशमध्या यांचे धीरा, अधीरा आणि धीराधीरा असे उप प्रकार असतात.
प्रगल्भा नायिका (३ प्रकार) १. स्वीया (हिचे २ प्रकार रतिप्रीतिमति आणि रत्यानंदप्रवषा) २. परकीया ३. प्रगल्भा यांचेही धीरा, अधीरा आणि धीराधीरा असे उप प्रकार असतात.

• परकीया नायिका      : (२ प्रकार) १. कन्या २. परोधा
परोधा नायिका           : (२ प्रकार) उद्धा आणि उद्बोधिता
उदुद्धा नायिका          : (३ प्रकार) गुप्ता, निपुणा (स्वयं दूती) आणि लक्षिता
गुप्ता नायिका             : (३ प्रकार) वृत्त सुरत गोपन, वर्तिष्यमान सुरत गोपन आणि वृत्त- वर्तिष्यमान सुरत गोपन
निपुणा नायिका          : (३ प्रकार) वाण निपुणा, क्रिया निपुणा आणि रतिवंचना निपुणा
लक्षिता नायिका          : (२ प्रकार) प्रच्छन्न लक्षिता आणि प्रकाश लक्षिता
प्रकाश लक्षिता             : (४ प्रकार) कुलटा, मुदिता, अनुशयाना आणि साहसिका
अनुशयाना नायिका      : (३ प्रकार) विघटितसंकेता, अप्राप्तभाविसंकेता आणि शंकितसंकेता- जारागमना

३. सामान्या नायिका : (४ प्रकार) १. स्वतंत्रा २. जनन्यधीना ३. नियमिता ४. कल्पितानुरागा (राय: १९८३)
       स्वाधीनपतिका, वासकसज्जिका, विरहोत्कंठिका, विप्रलब्धा, खंडिता, कलहान्तरिता, प्रोषितभर्तृका आणि अभिसारिका या आठ प्रमुख नायिका आपल्याला परिचित असतात. वक्रोक्तीगर्विता ही नववी नायिका गणली जाते. याशिवाय विशेषतः शिल्पांमध्ये दहावी मुग्धा ही एक उपनायिका तिच्या तरल भावदर्शनामुळे अत्यंत लोकप्रिय आहे.
   नायिकांच्या या प्रकारांचे अधिक वर्गीकरण केले गेले आहे. त्यात सामान्या, स्वीया आणि परकीया हे प्रमुख प्रकार, यातील स्वीया प्रकारची  नायकी हि नायकाची पत्नी असते. परकीया हि प्रेयसी किंवा अन्य स्त्री असते. क्वचित प्रसंगी दुसऱ्याची पत्नी किंवा परस्त्री सुद्धा असू शकते तर सामान्या नायिका हि गणिका किंवा वरांगणा असते. ( उदा. वसंतसेना ) या भेदाशिवाय नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्या उत्तमा, मध्यमा, अधमा अशाही असतात. याशिवाय नायिकांच्या वयोगटाप्रमाणे सुध्दा त्यांचे वर्गीकरण असून, बाला, तरुणी, प्रौढा, वृद्धा (प्रगल्भा) असेही त्यांचे चार प्रकारचे वर्गीकरण केलेले आढळते. त्यामुळे या सर्वांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या त्यांच्या शेकडो छटा मंदिरातून दिसतात.

स्वाधीनपतिका-

     सुरतातिरसेर्बद्धो यस्याः पार्श्वे तु नायकः ।
      सान्द्रामोद्गुणप्राप्ता भवेत् स्वाधीनभर्तुका ।। (नाट्य शास्त्र २४ पा. २१४)
  नायक जिच्या अधीन आहे अशी ही नायिका, स्वाधीनभर्तुका. उच्चारामध्ये चुकून भर्तृका असे म्हटले जाते. शिल्पांमध्ये नायक हा तिला प्रसन्न करण्यासाठी काही उपहार देतो, पाय चेपून तिची सेवा करताना किंवा प्रसंगी तिच्या ओठांना मद्याचा प्याला आपल्या हातांनी लावताना दिसतो. बरेच वेळा ही शिल्पे स्तंभावरील कोनाड्यांमध्ये किंवा द्वारशाखांवर दिसतात. काही शिल्पांमध्ये पुरुषा समोर स्त्री उभी असते आणि मागून तिला पुरुषाने आलिंगन दिले असून ती मागे मान वाकवून त्याला चुंबन देताना दिसते. हे स्वाधिनपतिकेचे शिल्प. याचा वेगळेपणा असा आहे की त्याने तिला वळून डोळे मिटायला सांगितले असते, नंतर तो हळूच तिच्या गळ्यात त्याने आणलेला सुवर्णालंकार घालतो. तेव्हा ती त्या मिटलेल्या डोळ्यांनी आणि आहे त्या स्थितीतच आपले दोनही हात त्यांच्या मानेभोवती घालून त्याला जवळ ओढून प्रेमळ कृतज्ञता व्यक्त करते. खजुराहोमधील एका शिल्पात कलाकाराने असामान्य शक्कल लढविलेली दिसते. नायकानी तिला कानातले एक अलंकृत कडे दिले असते. ते कडे पाहून नायिकेच्या स्मृती जाग्या झाल्यामुळे ती आरशात बघून त्या कड्याशी खेळत असते. ह्या शिल्पात त्या कड्याच्या बाहेरील नक्षीकाम देखील कलाकाराने कोरले असून तिच्या नक्की कुठल्या स्मृती जागृत होत आहेत हे दाखविण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर लालीयुक्त हास्य तर दाखवलेच आहे परंतु याशिवाय त्या कानातील कड्यात तिने आपले मधले बोट अडकवले आहे. हे शिल्प खजुराहोमधील जवारी मंदिरावर आहे.

चित्र क्र. १५३ : स्वाधीनपतिका, खजुराहो

  उचिते वासके या तु रतिसम्भोगलालसा ।
  मण्डनं कुरुते द्रष्टा सा वै वासकसज्जिता ।।
(नाट्यशास्त्र २४ पा. २१२)

          नायकाच्या आगमनाची वार्ता कळल्याने साजशृंगार करून अत्यंत अधीरतेने नायकाची प्रतीक्षा करणारी, रतीक्रीडेसाठी उत्सुक असलेल्या नायिकेस 'वासकसज्जीका' असे म्हणतात.
    ही नायिका पूर्ण नट्टापट्टा करून घरीच प्रियकराची वाट पाहत असते. शिल्पांमध्ये ती उभी कोरलेली असून तिच्या हातातला आरसा तिने तीच्या खाली सोडलेल्या सरळ हातात धरलेला असतो. साजशृंगार नुकताच पूर्ण झाल्याचे ते लक्षण असते. खजुराहोमधील खंडारिया महादेव मंदीरावरील शिल्पात तिने डाव्या हातातला आरसा खाली धरला असून उजवा हात भुवयांवर ठेवून दूरवर नजर लावलेली आहे. भुवयांमधील आठीमुळे तिची उत्कंठाही स्पष्ट दिसते. (पु. ल. देशपांडे यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, बायकांचा मेकअप पूर्ण होईपर्यंत कोणी आपल्याला पाहू नये असे त्यांना वाटते, मग त्याला कितीही वेळ लागो. परंतु तो पूर्ण झाल्याबरोबर लगेचच सगळ्यांनी आणि विशेषतः 'ह्यांनी' पाहून कौतुक करावे ही अपेक्षा असते.) अन्य काही शिल्पांमध्ये घराच्या सज्जावर उभी असलेली दूरवर नजर लावून बसलेली आणि कानातील डुलांशी किंवा गळ्यातील माळेशी चाळा करताना ती शिल्पांमध्ये दिसते.

चित्र क्र. १५४: वासकसजिका, खजुराहो

विरहोत्कंठिता-

 अनेककार्यव्यास‌ङ्गाद्यस्या नागच्छति प्रियः ।
तद्भागतदुःखार्ता विरहोत्कंठिता तु सा ।। (नाट्य शास्त्र २४ षा. २१३)
     जिच्यापासून प्रियतम लांब गेला असल्यामुळे त्याची ती आतुरतेने वाट बघत असे. अनेक शिल्पांमध्ये ही नायिका थोडी उदास असते.

चित्र क्र. १५५ :दिशोत्कंठिता, खजुराहो
   खजुराहोमधल्या जैन मंदिरावर ह्याचे एक उत्कृष्ट स्पष्ट शिल्प आहे. या शिल्पामध्ये प्रियकराचे तिला पत्र आले असून तो येणार असल्याची वार्ता कळल्यामुळे एका हातामध्ये पत्र आणि दुसरा हात तिने छातीवर ठेवला असून चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद स्पष्टपणे दिसतो.

विप्रलब्धा-

  यस्या दूर्ती प्रियः दत्वा संकेतमेव वा ।
 नागतः कारणेनेह विप्रलब्धा तु सा भवेत् ।।
(नाट्य शास्त्र २४ पा. २१७)
    ही नायिका संकेत स्थळाला आधी पोचते परंतु तिथे तिचा प्रियकर मात्र पोचलेला नसतो. ती त्याची वाट पाहत असते. या नायिकेच्या अनेक छटा आपल्याला शिल्पांमध्ये दिसतात. गतभेटीच्या स्मृतीत हरखून जाऊन मंद स्मित करीत असताना ती दिसते तर कुठे दूतीने पत्र दिले असेल का? या विचाराने शंकित असणारी, तर एका ठिकाणी वाट पाहून कंटाळा आल्यामुळे हाताने आळस देत चिडलेली अशीही दिसते. (पानगाव, जि. लातूर) येथील विठ्ठल मंदिरात (११ वे शतक) चिडलेल्या नायिकेचे उत्कृष्ट शिल्प आहे. जगत (राजस्थान) येथील देवी मंदिरातील (१० वे शतक) एका शिल्पात ती आपल्या सखी बरोबर संकेत स्थळाला पोचलेली दाखवलेली असून तिने प्रियकरासाठी एक मोठे फूल आणलेले असते. तो न आल्यामुळे चिडून जाऊन ती फुलाच्या पाकळ्या खुडताना दाखविले आहे.

चित्र क्र. १५६ : विप्रलब्धा, राजारानी मंदिर, ओडिशा

खंडिता-
     व्यासङ्‌ङ्गादुचिते यस्या वासके नागतः प्रियः ।
      तदनागमदुःखार्ता खण्डिता सा प्रकीर्तिता ।।
       (नाट्य शास्त्र २४ पा. २१६)

चित्र क्र. १५७ : खंडिता, रानी की वाव, पाटण
       प्रियकराची आपल्याच घरी किंवा अन्यत्र कुठेही वाट पाहून ती आल्यामुळे निराश झालेली नायिका. खंडित नायिकेचे बारा प्रकार सांगितले आहेत. त्यातला सर्वात दुःखदायक प्रकार म्हणजे तिच्याऐवजी अन्य दुसऱ्या स्त्रीकडे नायक गेल्यामुळे तिचा विश्वासघात झाल्यामुळे दु:खी झालेली नायिका. शिल्पांमध्ये याचे अनेक प्रकार कल्पकतेने कोरलेले दिसतात. नायकाची वाट पाहाणार्या नायिकेला त्याचे पत्र येते. ज्यात त्याने लिहिले असते की तो आज येऊ शकत नाही. एका हातात पत्र आणि दुसऱ्या हाताच्या तर्जनीने ती डोळ्याच्या कडा पुसताना दाखवलेली दिसते. पत्रामध्ये असे लिहिले असेल की तो कधीही येणार नाही तर ती दोन किंवा अधिक बोटांनी डोळे पुसताना दाखलेली असते. हाताची सर्व बोटे वापरून अश्रू पुसताना दाखविलेल्या शिल्पांत तिचा चेहरा झाकला जाईल म्हणून असे दाखवले जाते. खजुराहोमधील मंदिरात हे दोन्ही प्रकार दिसतात. रानी की वाव, पाटण (११ वे शतक, गुजरात) मध्ये हिच्या उचललेल्या डाव्या हातामध्ये प्रियकराचे पत्र असून त्यातील मजकूर केवळ तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून आपल्याला समजू शकतो. मूर्तिमंत कारुण्य तिथे प्रकटले आहे. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू टपटप पडत असल्याचा भास होतो.

    कलहांतरिता-

     नायकाशी भांडण झाल्यामुळे त्याच्यापासून दुरावलेली असलेली नाविका. शिल्पांमध्ये हा प्रकार थोडा अल्पसा दिसतो. परंतु याचे सर्वात उत्कृष्ट शिल्पांकन वेरुळ मधील कैलास लेण्यातील रावणानुग्रह शिल्पात दिसते. भांडण झाल्यामुळे शिव आणि पार्वती एकमेकांपासून लांब बसले होते. परंतु रावणाने कैलास हालवल्यामुळे त्याही स्थितीत तिने शंकराकडेच आधारासाठी झेप घेतली. या शिल्पात तिने त्याचा दंड धरलेला असून भीतीने त्याला बिलगलेली दिसते. या शिल्पातील पार्वतीची भूमिका कलहातरिता नायिकेच्या सारखी भासते.
चित्र क्र. १५८ : कलहांतरिता, कैलास मंदिर, वेरूळ

   प्रोषितभर्तृका :-

  अनेक दिवस अनेक वर्ष दूर देशी गेलेल्या नायकाचे अचानक आगमन झाल्यामुळे होणाऱ्या आनंदाने मुर्च्छा यावी अशी उत्कंठा आणि हुर्हुर यांचे वर्णन प्राचीन साहित्यात नेहमी दिसते.
         वेरुळमधील दशावतार लेणी (क्र.१५) मध्ये असणाऱ्या रंगमंडपावरील हे शिल्प थोडे जीर्ण झाले असले तरी, त्यातील उत्कटता मात्र लक्ष वेधून घेते. नायकाच्या अंगावर तिने धाव घेतली आणि त्याच्या आलिंगनातच तिला मूर्च्छा आल्यामुळे ती खाली कोसळत आहे आणि नायक अत्यंत धीराने तिला हळुवारपणे सावरून घेतो आहे असे हे प्रोषितभ्रर्तृकेचे एक दुर्मिळ शिल्प आहे.
     अभिसारिका - हित्वा लज्जान्तु या श्लिष्टा मदेन मदेनन च अभिसारयते कान्तं सा भवेद्भिसारिका ।।
(नाट्य शास्त्र २४, पा. २१९)
   मदनावेगाने वश होऊन लोकलज्जा आणि भय असूनही संकेतस्थानाकडे नायकाच्या आकर्षणाने निघालेली नायिका.

चित्र क्र. १५९ : प्रोषितभर्तृका, दशावतार लेणे, वेरूळ

   हिचे सहा प्रकार सांगितलेले आहेत. ज्योत्स्नाभिसारिका, तमोभिसारिका (रात्र अभिसारिका), दिवाभिसारिका, गर्वाभिसारिका, कामाभिसारिका आणि प्रेमवाक्याभिसारिका. शिल्पांकनामध्ये मागे वळून तळपायातला काटा काढताना ही दिसते. जवळजवळ सर्व मंदिरांमध्ये हे शिल्प दिसते. यातल्या काही छटा अत्यंत मनोहारी आहेत. रात्रअभिसारिका आहे दाखविण्यासाठी तारंगा (गुजरात ) येथील जैन मंदिरात भुजंग त्रासित अभिसारिकेचे शिल्पांकन दिसते. अंधारात निघालेली असताना सापाची सळसळ ऐकू येते. क्षणभर थांबून डावा पाय उचलून त्यावेळी वस्त्र ती एका हाताने घट्ट धरीत असून सळसळ जेथून ऐकू आली त्या दिशेला भयभीत होऊन पाहतानाचे हे शिल्प आहे. प्रियकराला भेटायला निघालेल्या अभिसारिकेची अनेकविध रूपे वेरुळ मध्येही दिसतात. दिवसाढवळ्या बाहेर पडलेली ती दिवाभिसारिका आहे. त्यामुळे लोकलज्जेचे भय अधिक, परंतु अचानक वाटेतील एकांतस्थळी त्याने तिला गाठले आणि पटकन चुंबन घेऊन तो चालता झाला, तर रात्रीच्या वेळेस घरातून बाहेर पडायची रक्त चोरी, परंतु संकेतस्थळाला पोहोचल्यानंतर अत्यंत निर्धास्तपणे गाढालिंगन देणारी रात्राभिसारिका. या दोघींचेही शिल्पांकन वाखाणण्याजोगे आहे. वेरुळमध्ये कैलासमंदिराच्या प्रदक्षिणापथावर ही दोन आलिंगन शिल्पे दिसतात. त्यातील पहिल्या शिल्पात ती दिवाभिसारिका आणि दुसऱ्या शिल्पात राजाभिसारिका दाखवली आहे. या प्रकारांमध्ये घरातून बहाणा करून बाहेर पडलेल्या देवळात जायच्या निमित्ताने किंवा नदीवरून पाणी आणायच्या निमित्ताने निघालेल्या अभिसारिकांना गुप्ताभिसारिकाही म्हणतात, म्हणजे दाखवायचे निमित्त एक पण अंतस्थ हेतू मात्र दुसराच.

चित्र क्र. १६०: अभिसारिका, खजुराहो

 चित्र क्र. १६१: दिवभिसारिका, कैलास मंदिर, वेरूळ

चित्र क्र. १६२ : रात्राभिसारिका, कैलास मंदिर, वेरूळ

   वक्रोक्तगर्विता -

     वक्रोक्तगर्विता नायिकेचे प्रेमगर्विता, सौभाग्यगर्विता, नैपुण्यगर्विता, सौंदर्यगर्विता असे चार रकार सांगितले आहेत.या नायिकेचे  स्मितगर्विता, यौवनमर्विवा मौकुमार्यागर्विता आणि विलासगर्विता हे हि प्रकार सांगितले आहेत. परंतु शिल्पकलेमध्ये याचे नेमकेपण ओळखणे थोडे अवघड जाते. सौदर्यगर्विता यामध्ये शुकभासिका आणि  कर्पूरमंजिरी या सुरसुंदरीचा समावेश होउ शकतो, कारण आपल्या सौंदर्याच्या बळावर त्या प्राण्यांना वश करताना दिसतात.

नैपुण्यगर्विता-

   वक्रोक्तगर्वितांपैकी नैपुण्यगर्विता नायिकेचे शिल्पांकन अनेक ठिकाणी आढळते. काही असामान्य गुणांची प्राप्ती झाल्यामुळे त्याचा अहंकार आलेला असतो. पानगाव (जि. लातूर) येथील विठ्ठल मंदिरात (११ वे शतक) सर्पाशी खेळणाऱ्या युवतीचे शिल्प आहे. केवळ रूपाचाच नाही तर कर्तृत्वाचा सुद्धा अहंकार येऊ शकतो हे दाखवणारे एक अत्यंत दुर्मिळ शिल्प इथे दिसते. या सुंदरीने तिच्या उजव्या हातामध्ये एका नागाला अलगद पकडलेले आहे, तिचा डावा हात डोक्यावर धरलेला असून त्यावर एका मुंगसाला तिने ठेवले आहे. मुंगुस आणि साप हे परस्परांचे जन्मजात शत्रू. त्या दोघांनाही तिने एकाच वेळेस लीलया ताब्यात ठेवले आहे.

चित्र क्र. १६३ : नैपुण्यगर्विता, केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी

या शिल्पाची सुधारित आवृत्ती आपल्याला धर्मापुरी (जि. बीड) येथील केदारेश्वर मंदिरातील (११वे शतक) शिल्पांमध्ये दिसतात. त्यातील एका शिल्पामध्ये त्या मुंगुसाने तिच्या हातावरून उडी मारली आणि आता आपण थेट त्या भुजंगाच्या तोंडात जाणार हे लक्षात आल्यावर त्याची केविलवाणी धडपड सुरू झाली. त्याच्या पायाच्या हालचालीने त्या युवतीचे उडलेले केस कलाकाराने दाखवले आहेत. धारासुर (जि. परभणी) येथील मंदिरात (११वे शतक) एका हातात विंचू आणि एका हातात कासव धरलेल्या नैपुण्यगर्वितेचे अनाकलनीय शिल्प आढळते. या दोन प्राण्यांवरती नियंत्रण मिळविण्याचा तिचा हेतू स्पष्ट होत नाही.

चित्र क्र. १६४: मुग्धा नायिका, खजुराहो

मुग्धा-

      स्वाधीनपतिका नायिकेतील एका प्रकारची ही नायिका, खरे पाहता ती एक उपनायिका असते. परंतु मंदिरामध्ये या प्रकारचे विपुल शिल्पांकन पाहायला मिळते. ही नायिका नायकाची पत्नीच (स्वीया) असते. शयनगृहात त्याची वाट पाहत असताना त्याला विलंब लागतो आहे हे लक्षात आल्यावर ती वस्त्रे बदलावयाला सुरुवात करते आणि अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता धाडकन तो प्रवेशतो. यातून तिची होणारी तारांबळ दाखवणारे हे शिल्पांकन असते. या मुग्धेचेही काही प्रकार असून त्यात अज्ञात यौवना, ज्ञात यौवना, ज्यात प्रौढा आणि प्रगल्भा असे दोन प्रकार असतात. त्याचप्रमाणे शिल्पांकनामध्ये अर्थावृत आणि अनावृत असे दोन प्रकारही दिसतात. अज्ञात यौवना म्हणजे नववधू, खजुराहो मधील शिल्पात तिचे कमरेवरील शरीर उघडे असून तिने लाजून झटकन वळून हाताने तोंड झाकलेले दिसते. त्या धांदलीमध्ये आपले शरीर उघडे पडले आहे याचेही तिला भान राहत नाही. काव्यात याचे असे वर्णन येते की, तोंडावर हात ठेवून तर ती वळते परंतु पुढे समईची मोठी ज्योत तेवत असते, तोंड झाकले तरी नायक आपल्याला न्याहाळत असेल या कल्पनेने ती दुसरा हात समईवर मारून ज्योत विझवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सासू तिला हात कशाने भाजला असे विचारते. रंगमंचावर "केहो कारण हात जलाई?" या काव्यावर आधारित नृत्य रचनेतून मुग्धेचे दर्शन नृत्यातून आजही होते. परंतु हीच नवयौवना नववधू काही दिवसांनी ज्ञातयौवना होते. बाहेर उगाच मित्रांच्या गराड्यात अडकलेल्या नवऱ्याचे आत लक्ष वेधण्यासाठी केवळ त्यालाच दिसेल अशा पद्धतीने अंगावरचा पदर ढळू देते. तो सावरण्याचा कुठलाही प्रयत्न न करता लाजल्यासारखे दाखविण्यासाठी हाताने तोंड झाकते आणि तर्जनी आणि अन्य बोटे यांच्यात किंचित अंतर करून त्या फटीतून तो नक्की आतच येत असल्याची खात्री वेगवेगळ्या छटा दाखवणारी अनेक शिल्पे आहेत. औंढ्या नागनाथ येथील मंदिरात तर मुग्धा पूर्ण विवस्त्र असून अर्धवट वळून तिने असाहाय्यपणे दोन्ही हात डोक्यावर धरलेले दिसतात.

चित्र क्र. १६५ : मुग्धा नायिका, खजुराहो
    रानी की बाव,(पाटण, गुजरात) मध्ये तर तिची उडालेली तारांबळ ही कल्पनातीत दाखवलेली आहे. पूर्ण विवस्त्र अवस्थेत असताना तो अचानक समोरूनच आल्यामुळे तिने एका हाताने आपले तोंड झाकले असून दुसरा हात तिने कमरेपाशी धरून तिची अगतिकता व्यक्त केली आहे. जीवनातल्या ह्या अत्यंत तरल परंतु पूर्णपणे खाजगी अशा क्षणाचे शिल्पांकनही करून दाखविणारे शिल्पी हे जगावेगळेच म्हणावयास पाहिजेत.
    मुग्धा नायिकेचे शिल्पांकन हे अतिशय कठीण असते. जीवनातला तो प्रसंग चित्रपटामध्ये 'सुहाग रात' म्हणून अतिशय तरलतेने दाखविला जातो. त्याचे शिल्पांकन करणे म्हणजे खरोखरच एक दिव्य आहे. खजुराहोमध्ये नायिका लाजेने पटकन वळली आहे आणि तिचे वस्त्र ढळले आहे असे अज्ञातयौवना नायिकेचे शिल्प आढळते, तर लटकेच लाजल्याचे नाटक करून हाताने चेहरा तर झाकल्यासारखा करते, परंतु दोन बोटांच्या फटीतून आता तरी नायक नक्की शयनगृहात येतो आहे ना याची खात्री करणारी ज्ञातयौवना किंवा प्रगल्भा मुग्धा नायिकेचे शिल्पही दिसते.

चित्र क्र. १६६ : मुग्धा नायिका, रानी की वाव, पाटण

चित्र क्र. १६७: सुरसुंदरी, दर्पणा, खजुराहो

       आपल्या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेल्या गोष्टींचे अत्यंत सूचकतेने दर्शन घडविण्यासाठी सुरसुंदरींच्या शिल्पांची रचना केलेली दिसते. गीतेच्या १३ व्या अध्यायामध्ये (ग्लोक ४ आणि ५) भगवंताने मानवी शरीराला क्षेत्र असे म्हटले आहे. हे मूलतःच विकार युक्त असते. त्यामुळे यातील एक अर्थ असाही निघतो की ज्ञानेंद्रियेही विकारात्मक होऊ शकतात. कारण ती जशी ज्ञानाची प्रवेशद्वारे असतात तशी ती विकारांचीही होऊ शकतात. त्यामध्ये गुणांचे वर्णन करताना एक सावधगिरीचा इशारापण दिला आहे. त्याच्यावर ज्ञानदेवांनी स्पष्ट निरूपण केले आहे. (ज्ञा.१३ ओवी क्र. ११७ ते १२४) शरीराची पाच ज्ञानेंद्रिये ही जशी ज्ञानाची प्रवेशद्वारे असतात तशीच ती विकारांचीही प्रवेशद्वारे ठरू शकतात. शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श ही माध्यमे विकारांनाही कारणीभूत ठरू शकतात. या विकारांपासून सावध राहण्याचा इशारा देणाऱ्या काही स्त्रीशिल्पांना सुरसुंदरी असे संबोधतात, आरशात स्वतःचे रूप पाहणाऱ्या, अत्तराची कुपी उघडून वासाने धुंद होणाऱ्या, अतिरेकी मद्यपान करून विंगणाऱ्या किंवा प्रियकराला चोरून पत्र लिहिणाऱ्या स्त्रियांची शिल्पेही रूपविकार, गंधविकार, अविकार, शब्दविकार आणि स्पर्शविकार दर्शवितात. परंतु ही ज्ञानेंद्रिये कामविकाराने ग्रासली गेल्यास ज्ञानांऐवजी विकारांचेच दर्शन घडवतात (भगवद्‌गीता: अ.१३, श्लोक ५-६), (शानेश्वरी अ. १३. ओबी क्र. ११७-१२४).
      या विकारांवर विजय मिळविण्यासाठी मनाचे संयमन करणे आवश्यक असते. व्यवहारामध्ये हे कितीही खरे असले तरीही कोणालाही सांगायला गेल्यास त्याला ते रुचत नाही. सरळ सांगितले (स्पष्टोक्ती) तर त्याला राग येतो. उपहासाने सांगितले (वक्रोक्ती) तर अपमान वाटून तो दुखावला जातो. परंतु जर सूचकतेने सांगितले (अन्योक्ती) तर ते समजून ग्रहण करण्याची शक्यता पण असते. गीतेतील या प्रबोधनाचे शिल्पांकन कलाकारांनी काही सुरसुंदरींच्या शिल्पांद्वारे केलेले आहे. इतक्या रूक्ष विषयाचे इतके मनोहारी शिल्पांकन प्रशंसनीय तर आहेच, परंतु पिढ्यापिढ्यांमध्ये यातील अनेक छटा प्रकट करणारी आणि त्यातील विविधता दर्शवणारी कलाकारांची वैचारिक प्रगल्भता थक्क करणारी आहे.

चित्र क्र. १६८ : सुरसुंदरी, दर्पणा, खजुराहो

रूपविकार-

    हातात आरसा घेऊन त्यामध्ये आपले रूप असते की त्यात दुसऱ्या कोणाच्या रूपावर भाळायची न्याहाळणारी नवयौवना ही जवळजवळ सगळ्या मंदिरांमध्ये दिसते. ती आपलेच रूप न्याहाळताना इतकी गढून गेलेली शक्यताही नसते. या सुरसुंदरीला 'दर्पणा' असे म्हणतात. काही शिल्पांमध्ये ती आपले असे (चोरून) रूप न्याहाळत असताना दुसरे कोणी आपल्याला पाहत नाही ना? याचाही ती एका डोळ्यानी वेध घेताना दिसते. इतकेच नाही तर काही दर्पणांच्या शिल्पात तिच्या हातात अर्धगोल आरसा धरलेला असतो. या आरशातील वरच्या गोलार्धात तिला आपले रूप दिसत असते. तर निम्न गोलार्धात ती आपलेच यौवन न्याहाळत असते.
   सौंदर्य केवळ रूपाचेच नसते, तर यौवनाचेही असते. एवढेच नाही तर त्याचा रूपाप्रमाणेचेच त्याचाही अहंकार असतो. एका हातामध्ये पिकलेले आंबे आणि तिच्या दुसऱ्या हातावर एक पोपट दाखवलेला असतो हिला 'शुकसारिका' असे म्हणतात. शिल्पामधील ही सुंदरी तिच्या एका हातातल्या पोपटाला ती तिच्या दुसऱ्या हातात धरलेल्या आंब्यांबरोबर तिच्या यौवनाचेही प्रलोभन देते.
   कर्पूरमंजरी या नावाने ओळखली जाणारी सुरसुंदरी नुकतेच स्नान करून आपले लांब सडक केस पिळताना दिसते. हिच्या शेजारी एक किंवा दोन पक्षीही दिसतात. ह्यामध्ये दोन कल्पना आहेत. तिचे घनदाट काळे केस त्या चातक पक्षाला ढगासारखे भासतात आणि त्यातून पडणारे पाणी पावसाचे थेंब समजून तो चोच वर करून पिताना दिसतो. अन्य शिल्पात तिच्या खाली हंस असतो. हा पक्षी मोती खातो असा समज आहे. तिच्या अंगावरून पडणारे थेंब सकाळच्या सूर्याच्या किरणांमध्ये मोत्यासारखा चमकताना दिसतात. त्यांना मोती समजून ते खायचा प्रयत्न तो हंस करतो आहे असे दिसते. टपटप पडणारे पाण्याचे थेंब हे स्थिर शिल्पामध्ये कोरण्याची अफाट किमया या कलाकारांनी केलेली आहे. खजुराहो येथील लक्ष्मण मंदिरावर असलेल्या कर्पूरमंजिरीच्या शिल्पात तिच्या खाली दोन्ही पक्षी एकत्रित दाखवलेले आहेत. एकाच वेळेस दोन पक्ष्यांना आपल्या सौंदर्यान मोहित केल्याचा अहंकार तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. रूपाचा हा विकारच असा आहे की तो मनुष्याला आत्मकेंद्रित आणि संकुचित करून टाकतो. त्यामुळे क्षणभंगुर अस्तित्वाच्या देह सौंदर्याच्या मर्यादा ओळखून सावध राहिले पाहिजे असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न असतो.

चित्र क्र. १६९ : कर्पूरमंजिरी, खजुराहो

रसविकार-

    हे शिल्प तसे थोडे दुर्मिळच म्हणावे लागेल.मनुष्यमात्राला रोज भोजन घेता यावे आणि ते रुचकरही असावे यासाठी तोंड आणि जिव्हा ही इंद्रिये दिली आहेत. परंतु भोजना- बरोबरच किंवा त्या आधी 'रसपान' ही करण्याची काहींना आवश्यकता भासते. या विकारापासून सावध करण्यासाठी या सुंदरीचे शिल्प कोरलेले असते. खजुराहोच्या लक्ष्मण मंदिरावर (१० वे शतक) आणि खंडारिया महादेव मंदिरावर (११वे शतक) मद्यपान करून झिंगणाऱ्या युगलाचे शिल्प आहे. त्यांच्या पायाशी तीन रिकामे कुंभ पडले असून हातात घरलेल्या रिकाम्या कुंभातील शेवटचा थेंब घेण्यासाठी ते दोघे धडपडताना दिसतात, मद्याचा अंमल चढला असल्यामुळे त्यांचे डोळे जवळजवळ मिटलेले असून गाल सुजलेले दिसतात. देवळाच्या बाहेरील भिंतीवर हे शिल्प मुद्दाम लावलेले आहे. भक्तांसाठी इशारा असा आहे की जर यावर विजय मिळवता येत नसेल तर मंदिरात आत जाण्याची आवश्यकता नाही. अशा भक्तांना परमेश्वराचे दर्शन कदापि होणे शक्य नाही.

चित्र क्र. १७०: रसविकार, खजुराहो

गंधविकार -

    श्वसनक्रिया ही स्वाभाविक आणि नैसर्गिक  आवश्यकता असते. शरीराला प्राणवायूची आवश्यकता असले त्यातून रक्तशुद्धी होत असते. परंतु याचबरोबर नाकाचा उपयोग घ्राणेंद्रिय म्हणूनही होऊ शकतो. एक अमुकच वास आवडतो इतपत समजता येणे शक्य आहे. परंतु तो सदैव उपलब्ध व्हावा यासाठी त्याचा अर्क असलेले द्रव्य आपल्या जवळील कुर्यात बाळगावयाचे आणि अहोरात्र त्याचा सुवास घ्यायचा हो विकारच ठरतो. खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिरावर असलेल्या सुरसुंदरीच्या डाव्या हातात अत्तराची कुपी धरली असून उजव्या हाताने तिने त्याचे टोपण काढलेले असून ती डोळे मिटून मोठ्ठा श्वास घेऊन त्याच्या सुवासाचा आनंद घेताना दिसते.

चित्र क्र. १७१: गंधविकार, खजुराहो

    शब्दविकार आद्याक्षरे शिकून त्याचे लेखन वाचन करता आले म्हणजे साक्षर झाले असे मानले जाते. याद्वारे कधी कधी परमेश्वराचे नामस्मरण किंवा ज्ञानमूलक लेखन करता यावे अशीही अपेक्षा असते. परंतु लिहितावाचता यायला लागल्यावर सगळे चांगलेच लिहिले जाईल अशी प्रेरणा बुद्धीला होणे कठीण असते. पत्रलेखिका या नावाची सुरसुंदरी या विकाराचे दर्शन घडविण्याकरता शिल्पात दिसते. खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरात लेखणी घेऊन कुणाला दिसू नये म्हणून एका बाजूला वळून, लपून हातातील कागदावर काहीतरी लिहिताना ती दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न हास्य दिसते, कारण ती प्रेमपत्र लिहीत असते. खिद्रापूर आणि धर्मापुरी या ठिकाणच्या सुरसुंदरी वर्गात शिक्षिकेने फळ्यावर लिहावे तशा एका मोठ्या कागदावर डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हातात अत्यंत नाजूकपणे लेखणी धरून पाठमोऱ्या पत्र लिहिताना दिसतात. कलाकाराने त्या कागदावर पाच सहा ओळींचा मजकूरही लिहून टाकला आहे.

स्पर्शविकार-

      स्पर्शविकार हा मानवी मर्यादांची स्पष्टपणे जाणीव करणारा विकार आहे. महंत, ऋषी, मुनी इतकेच काय इंद्रादी देवही त्यापासून बाचू शकले नाहीत. हा त्वचा या इंद्रियाचा विकार आहे
चित्र क्र. १७२ : शब्दविकार खजुराहो

गंधविकार -
      श्वसनक्रिया ही स्वाभाविक आणि नैसर्गिक आवश्यकता असते. शरीराला प्राणवायूची आवश्यकता असले त्यातून रक्तशुद्धी होत असते. परंतु याचबरोबर नाकाचा उपयोग घ्राणेंद्रिय म्हणूनही होऊ शकतो. एक अमुकच वास आवडतो इतपत समजता येणे शक्य आहे. परंतु तो सदैव उपलब्ध व्हावा यासाठी त्याचा अर्क असलेले द्रव्य आपल्या जवळील कुर्यात बाळगावयाचे आणि अहोरात्र त्याचा सुवास घ्यायचा हो विकारच ठरतो. खजुराहोमधील चित्रगुप्त मंदिरावर असलेल्या सुरसुंदरीच्या डाव्या हातात अत्तराची कुपी धरली असून उजव्या हाताने तिने त्याचे टोपण काढलेले असून ती डोळे मिटून मोठ्ठा श्वास घेऊन त्याच्या सुवासाचा आनंद घेताना दिसते.

चित्र क्र. १७१: गंधविकार, खजुराहो

       शब्दविकार आद्याक्षरे शिकून त्याचे लेखन वाचन करता आले म्हणजे साक्षर झाले असे मानले जाते. याद्वारे कधी कधी परमेश्वराचे नामस्मरण किंवा ज्ञानमूलक लेखन करता यावे अशीही अपेक्षा असते. परंतु लिहितावाचता यायला लागल्यावर सगळे चांगलेच लिहिले जाईल अशी प्रेरणा बुद्धीला होणे कठीण असते. पत्रलेखिका या नावाची सुरसुंदरी या विकाराचे दर्शन घडविण्याकरता शिल्पात दिसते. खजुराहोमधील लक्ष्मण मंदिरात लेखणी घेऊन कुणाला दिसू नये म्हणून एका बाजूला वळून, लपून हातातील कागदावर काहीतरी लिहिताना ती दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक अत्यंत प्रसन्न हास्य दिसते, कारण ती प्रेमपत्र लिहीत असते. खिद्रापूर आणि धर्मापुरी या ठिकाणच्या सुरसुंदरी वर्गात शिक्षिकेने फळ्यावर लिहावे तशा एका मोठ्या कागदावर डावा हात कमरेवर ठेवून उजव्या हातात अत्यंत नाजूकपणे लेखणी धरून पाठमोऱ्या पत्र लिहिताना दिसतात. कलाकाराने त्या कागदावर पाच सहा ओळींचा मजकूरही लिहून टाकला आहे.
 स्पर्शविकार- स्पर्शविकार हा मानवी मर्यादांची स्पष्टपणे जाणीव करणारा विकार आहे. महंत, ऋषी, मुनी इतकेच काय इंद्रादी देवही त्यापासून बाचू शकले नाहीत. हा त्वचा या इंद्रियाचा विकार आहे १७८ / प्राचीन मंदिरे, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे

चित्र क्र. १७२ : शब्दविकार खजुराहो

चित्र क्र. १७३ : स्पर्शविकार, विंचू आणि स्त्री, खजुराहो

   आणि मानवी देहाचे हे सर्वात मोठे इंद्रिय आहे. हा विकार क्षणात उत्पन्न होऊ शकतो. कामदेवाला दिलेल्या शापाप्रमाणे तो वायुरूपाने तर संचार करतोच, परंतु कुठेही आणि कधीही जाऊन तो त्याचा परिणाम साधू शकतो. याचे शिल्पांकन करताना कलाकाराने वापरलेल्या कल्पकतेतून जगातील असामान्य आणि अद्भुत अशा कलाकृती निर्माण केल्या गेल्या. यातील सर्वात ठळकपणे दिसणाऱ्या सुरसुंदरीचे शिल्प म्हणजे दर्शकाकडे तोंड करून मांडीवर विंचू कोरलेली तरुणी. अंगावर विंचू चढत असल्यामुळे त्याला हाताने झटकून टाकण्याऐवजी दोन्ही हातांनी कमरेजवळील निऱ्या सैल करून अंगावरील वस्त्रच झटकून टाकताना ती दिसते. हा अंगावर चढणारा विंचू काल्पनिक असतो. अनेक ठिकाणी त्याला गोमेसारखे असंख्य पाय काढलेले असतात. त्याच्या पुढील नांग्या खेकड्याप्रमाणे आणि त्याचे शेपूट त्याच्या टोकावरील असणाऱ्या विषकुपी सहित कोरलेले असते. हा विंचू म्हणजे एकनाथ महाराजांच्या 'विंचू चावला, विंचू चावला' या भारुडामधील विंचू आहे. तो कामविकाराचा विंचू आहे. त्याने एकदा डंख मारला की त्याचे विष सर्वांगात भिनते आणि अंगांगाची लाही लाही होते. अंगावरची वस्त्रेही नकोशी होतात. शिल्पामधील सुरसुंदरी अशीच बेभान होऊन अत्यंत निर्लज्जपणे निर्वस्त्र व्हायला जराही संकोच करताना दिसत नाही. अशा सुरसुंदरीचे शिल्प पानगाव, पाटण , खजुराहो, खिद्रापूर यांसह अनेक देवळांमध्ये दिसते.
   या शिल्पांकनाचे एक कल्पक, मनोहारी परंतु थोडेसे उत्तान शिल्पांकनही बघावयास मिळते. आलसकन्यांसारखे हे शिल्प असते. उन्मादाच्या आवेगात तिच्या प्रियकारानी तिच्या पाठीवर नखाचे ओरखडे काढले तरी तिच्या ती लक्षात आले नाही. कालांतराने वेदना कशाची म्हणून ती आपल्या उजव्या हातांच्या बोटांनी पाठ चाचपडताना दिसते. खजुराहोमधील या शिल्पात तिच्या उघड्या पाठीवरील उमटलेले नखांचे ओरखडेही स्पष्टपणे दिसतात. याला नखःछेद असेही म्हणतात. या विकारांचे अधिक सूक्ष्म दर्शनही आपल्याला अनेक ठिकाणी दिसते.

चित्र क्र. १७४: स्पर्शविकार, खजुराहो

२१. कामशिल्पे


चित्र क्र. १७५ : कामशिल्प, खजुराहो

     मंदिरामधील शिल्पांमध्ये वरील सर्व वर्गीकरणाशिवाय परंतु ठळकपणे नजरेत भरतील अशा एका शिल्पांचा प्रकार म्हणजे कामशिल्पे. खजुराहो, कोणार्क आणि भुवनेश्वर येथील मंदिरांमध्ये यांचे शिल्पांकन थोडे अधिक दिसते. परंतु दहाव्या शतकाच्या पुढील सर्वच मंदिरांमध्ये कामशिल्पे आढळतात. तुलनेने यांची संख्या मात्र फारच कमी असते. खजुराहोची मंदिरे यासाठी प्रसिद्ध असली तरी तेथील मंदिरावरील एकूण शिल्पांपैकी केवळ ३ टक्केच शिल्पे अशी आहेत. अन्य मंदिरांमध्ये याहीपेक्षा कमी प्रमाणात ती दिसतात. काही मंदिरात तर तशी एक किंवा दोनच शिल्पे आढळतात. आधुनिक काळामध्ये यासंबंधी उघडपणे काही बोलले किंवा सांगितले जात नाही आणि उलट देऊन म्हणजे धार्मिक स्थान असे मानले गेल्यावर तिथे अशा शिल्पांचे प्रयोजन काय, असा प्रश्न नक्कीच पडतो.
   यासंबंधी अनेक भ्रामक कथा सांगितल्या जातात.
१. त्या काळी बौद्ध धर्माच्या प्रचंड प्रभावामुळे समाजात वैराग्य भावना निर्माण झाली आणि त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी या शिल्पांचा उपयोग केला गेला.
२. त्या काळी शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले नव्हते आणि कामक्रीडेचे शिक्षण देण्यासाठी या शिल्पांचा उपयोग केला गेला.
३. वात्स्यायन याचा कामसूत्र नावाचा ग्रंथ हा सर्व परिचित होता. त्यामध्ये त्याने विविध अशा ६४ आसनांची सूची आणि त्यांची वर्णने दिली होती. त्याप्रमाणे येथे ती विविध आसने कोरलेली आहेत.
४. त्या काळी भयंकर युद्ध सुरू होती आणि युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ते तरुण ठार होत असल्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागली. तेव्हा राजाने प्रजोत्पादनाला उत्तेजन देण्यासाठी ही मंदिरे बांधून त्यावर या शिल्पांची स्थापना केली.
५. याशिवाय तेथील गाईड्स हे त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार आणि त्यांच्यासमोरील प्रेक्षकानुसार अनेक चित्रविचित्र कपोलकल्पित कथा रचून त्या सांगताना आढळतात. ज्यांचा त्या शिल्पांशी आणि ते शिल्प कोरण्यामागील प्रयोजनाशी काहीही संबंध नसतो.
      विशेषतः खजुराहो आणि कोणार्कमध्ये आलेल्या पर्यटकांना या मंदिरात याच्याशिवाय दुसरे काहीच नाही असे भासवून या मंदिराची कामसूत्र टूर घडविली जाते. गेले अनेक वर्षे हे काम सातत्याने सुरू असल्यामुळे या संबंधीचे प्रचंड गैरसमज आपल्या देशात आणि जगभर पसरवले गेलेले आहेत.
   साधारणपणे अठराव्या शतकापासून पाश्चात्त्यांनी या मंदिराचा अभ्यास सुरू केला. यामध्ये अर्थातच ब्रिटिशांची संख्या अधिक होती. त्यांच्या धर्मामध्ये तर हा विषय केवळ निषिद्ध होता एवढेच नाहीतर कोणत्याही कामक्रीडेला पापाचरण मानले होते. त्यामुळे त्याचे असे हे स्पष्ट ठळक आणि अगदी उघडे दर्शन त्यांना फारच धक्कादायक वाटले. त्याचप्रमाणे ३००-४०० वर्षाच्या मुसलमानी सत्तेच्या प्रभावामुळे सामान्य हिंदू देखील या मंदिरापासून दुरावले गेलेले होते. यातील अनेक मंदिरे तर पूर्ण अज्ञातवासात गेली होती. एकेका प्रांताचे सर्वेक्षण करताना त्यामध्ये प्राचीन मंदिरांची गणना ही ब्रिटिशांनी केल्यामुळे शेकडो मंदिरे प्रकाशात आली आणि हजारो उद्ध्वस्त मंदिरांच्या अवशेषांचाही शोध लागला. या प्रक्रियेमध्ये भारताचे प्राचीनत्व आणि त्याच्या प्राचीन संस्कृतीचाही शोध त्यांना लागला. त्यापैकी काहीजणांनी याच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात केली. ज्यामध्ये विल्यम जोन्स, जेम्स प्रिन्सेप, विलफोर्ड, अलेक्झांडर कनिंगहॅम, हॉजसन यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याशिवाय अन्य अनेकांचे त्यात योगदान आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात जॉन मार्शल ते मॉर्टिमर व्हीलर पर्यंत अनेक संशोधकांची मोठी मालिका आहे. किंबहुना आधुनिक काळामध्ये प्राचीन भारतासंबंधीची माहिती आपल्याला कळली याचे सर्व श्रेय या संशोधकांचेच आहे. आजही प्राचीन मंदिरांमधील विज्ञान आणि त्यातील शिल्पांमधील आधुनिक विज्ञानाशी संबंध यावर अमेरिकन किंवा इतर परदेशी पुरातत्त्वज्ञ अभ्यास करत असून भारतामध्ये हा विषय उपेक्षितच आहे.
   ज्या वेळेस भारतात आलेले विदेशी संशोधक प्रथम या मंदिरांना भेट द्यायला गेले तेव्हा तेथील आसपासची परिस्थिती दयनीय होती. उदाहरणार्थ, खजुराहोमध्ये फ्रैंकलीन (१८३८), बर्ट (१८६८) आणि नंतर कनिंगहॅम (१८७०) गेले तेव्हा काही लिपलेल्या मातीच्या भिंतींच्या घराचे ते एक छोटे खेडे होते. यामुळे यांच्या पूर्वजांनी ही मंदिरे उभारली असतील यावर तेथे येऊन गेलेल्या ब्रिटिशांचा विश्वासच
 बसत नव्हता. देशभरातील सर्व मंदिरांची वर्णनं लिहिताना त्यांची नक्की स्थाने आणि संख्या जशी ते नोंदवून घेत होते त्याचप्रमाणे तेथील शिल्पांचेही वर्णन ते करीत असत. या सर्व नोदींमध्ये खजुराहोच्या मंदिरासंबंधी लिहिताना असे उल्लेख आढळतात, "येथील मंदिरामध्ये देवदेवतांची, गायक, वादकांची शिल्पे असून या देवळांवर काही अभ्रद शिल्पेही आहेत." त्यांनी याचा उल्लेख अभद्र (obscene) असा केल्यामुळे याचा अनुवाद करणाऱ्यांनी तीच भाषा वापरली. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत देखील हे असेच चालले होते. मराठी पुस्तकांमध्ये त्या मंदिरावर देवदेवतांची शिल्पे आणि 'तसली काहीशी शिल्पे' आहेत असे उल्लेख येत राहिले. यामुळे यासंबंधी गैरसमजच अधिक पसरत राहिले. आजही यासंबंधी फारशी प्रगती झालेली नाही असे दिसते.
   विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईच्या डॉ. देवांगना देसाई यांनी यासंबंधी विस्तृत संशोधन केले आणि 'भारतातील कामशिल्पे' या विषयावर प्रबंध सादर केला. या क्षेत्रातील भारतीय विद्वानांमधील हे सर्वात उल्लेखनीय कार्य म्हणावे लागेल.
   वात्स्यायनाचे कामसूत्र (इ.स. ३रे शतक) ते कोक्कोक किंवा कल्याणमल्लाचे रतिरहस्यापर्यंत (इ.स.१२ वे शतक) कामशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले गेले. या ग्रंथाचे दाखले देऊन या शिल्पांचे समर्थन करण्याचाही बराचसा प्रयत्न झाला. परंतु या शिल्पांचे नेमके प्रयोजन सांगण्यास हे पुरेसे ठरत नाही. अभ्यासकांनी काढलेले काही निष्कर्ष असे आहेत.
१. हिंदू तत्त्वज्ञानामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यातून जीवनाची परिपूर्णता होते. काम हा एक पुरुषार्थ असल्यामुळे मंदिरामध्ये त्याचेही दर्शन करणे अपरिहार्यच ठरते. (अनेक मंदिरामध्ये कामशिल्पे आढळत नाहीत.) कंबोडीयामधील मंदिरांमध्ये एखादे कामशिल्प अपवादानेही आढळत नाही.
२. काम हा जीवनातील अविभाज्य घटक असल्यामुळे इतर दैनंदिन व्यवहाराप्रमाणे त्याचेही शिल्पांकन आवश्यक मानले गेले. (कोणार्क येथील रथ चक्रातील आऱ्यांमधील शिल्पात दिनक्रम दाखवला आहे. सकाळी उठणे, स्नान करणे याबरोबर एक कामशिल्पही दाखविले आहे).
३. सांख्य तत्त्वज्ञानामध्ये पुरुष आणि प्रकृती, वैशेषिक सूत्रामध्ये जड आणि चेतन तर वेदान्तामध्ये ब्रह्म आणि माया यांचे अद्वैत (द्वैत ?) असते असे मानले गेले. याचे हे शिल्पांकन असावे असे काहींचे मत आहे.

चित्र क्र. १७६: कामशिल्प, खजुराहो

  ४. बृहदारण्यक उपनिषदामधील खालील श्लोकात आत्म्याचे परमात्म्याशी होणाऱ्या मीलनाचे वर्णन केले गेले आहे.
तद्यथा प्रियया स्त्रिया सम्परिशवक्तो,
 न बाह्यं किंचन वेद नान्तरमेवमेवायं, 
पुरुषं प्राज्ञेनात्मना समनरिशवक्तो,
 न बाह्यं किंचन वेद नान्तरं तद्वा.
आस्थैतदाप्तकामकामात्कामं रूपं शोकान्तरम् ।। (श्लोक: ४.३.२१)
     आपल्या प्रिय पत्नीला आलिंगन देणाऱ्या पुरुषाला आतील किंवा बाहेरील ज्ञान नसते त्याप्रमाणे हा पुरुष प्रज्ञामय आत्म्याशी एकरूप झाल्याने तो बाहेरच्या विषयांबद्दल अनभिज्ञ असतो. त्याचप्रमाणे आतही अनभिज्ञ असतो, हे त्याचे आत्मतृप्त, आप्ततृप्त, निष्काम आणि शोकशून्य असे स्वरूप असते.
भारतीय मंदिरांचे एक ज्येष्ठ अभ्यासक कृष्णदेव यांच्या मते कामशिल्प कोरण्याचे प्रयोजन वरील श्लोकाप्रमाणे असावे.
५. भगवद् गीतेतील पाचव्या अध्यायातील तेविसाव्या श्लोकात, शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ।।
असे भगवंताने म्हटले आहे ज्याचे स्पष्टीकरण ज्ञानदेवांनी (ज्ञा. अध्याय ५) पुढीलप्रमाणे दिले-
तिये आलिंगनमेळी । होय आपेंआप कवळीं ।
तेथ जळ जैसें जळीं। वेगळे न दिसे ।।१३३ ।। कां आकाशीं वायू हारपे । तेथे दोन्ही हे भाष लोपे ।
तैसें सुखचि उरे स्वरूपें । सुरतीं तिये ।।१३४ ।।
उपर्युक्त ओळींप्रमाणे तंतोतंत शिल्पांकन कामशिल्पांमध्ये दिसते.
६. भारतामध्ये तंत्र विद्येचा प्रसारही प्राचीन काळापासून सुरू होता. जादूटोणा करून अघोर मागनि साधना करणारे तांत्रिक बरेच होते. राजसत्तांवर या तांत्रिकांचा प्रभाव असे. त्यामुळे त्याचे प्रतिनिधित्व करणारी ही शिल्पे असावीत. याला एका प्रवास वर्णनात पुरावा दिला जातो. इब्न बतुता, हा अरबी प्रवासी चौदाव्या शतकामध्ये (इ.स. १३३२) खजुराहोला गेला होता. तेव्हा तेथील नगरे उजाड आणि उ‌द्ध्वस्त झाली असल्याचे त्याने लिहून ठेवलेले आहे. त्याच्या तिथल्या प्रवास वर्णनात त्याने असेही म्हटले आहे की येथे मोठी मंदिरे असून त्यामध्ये काही तांत्रिक आणि योग्यांची वस्ती आहे. हे मंत्र साधनेने रोग बरे करतात. अगदी कुष्ठ रोग सुद्धा. यांच्याकडे केवळ हिंदूच नाही तर मुसलमानही येऊन उपचार करून घेतात. यावरून खजुराहोमध्ये तांत्रिकांचा प्रभाव आधीपासूनचा होता असे दिसते. तांत्रिक साधनेमध्ये मनुष्य मैथुनाबरोबरच, प्राणी मैथुनही राहत असे, ज्याचे शिल्पांकन खजुराहोमध्ये काही ठिकाणी दिसते.
  ७. डॉ. देवांगना देसाई यांच्या संशोधनाप्रमाणे खजुराहोमधील कामशिल्पांमध्ये 'सांध्य भाष ज्याचा शब्दशः अर्थ द्वैअर्थी शब्द असा होतो, या सांकेतिक भाषेतील प्रतीके म्हणून ही शिल्पे असावीत. सामान्य माणसाला प्रथमदर्शी जे दिसते त्यातच तो खिळून राहतो आणि त्यातील तांत्रिक विद्येची गुपिते जी त्यात दडवलेली असावीत ती फक्त तांत्रिकांनाच कळतात. कुंडलिनी शक्तीचे वर्णन करताना कुंडलिनी शक्तीची तुलना धोबिणीच्या नृत्याशी केली आहे. तसेच तेथील लक्ष्मण मंदिरावरील कामशिल्पांना कृष्णमिश्र लिखित 'प्रबोध चंद्रोदय' या नाटकाचे रूपक मानले गेले आहे, ज्यामध्ये विवेक या राजाचे महामोह या राजाबरोबर युद्धाचे वर्णन येते. या नाटकाच्या दुसऱ्या अंकामध्ये महामोह मिथ्यादृष्टीला, आपल्या पत्नीला, पार्वती शिवाच्या मांडीवर बसून ज्याप्रमाणे रत झाली त्याप्रमाणे मिलनाचे आवाहन करतो. या प्रसंगाचे शिल्पांकन लक्ष्मण मंदिरावरील काही कामशिल्पांमध्ये असल्याचे त्यांचे मत आहे.
   ८. देवळावर वीज पडू नये म्हणून कोरलेली ही शुभ लक्षणे (दृष्ट लागू नये म्हणून काही उपाय केले जातात त्याप्रमाणे) असावीत असेही एक मत आहे. यावर डॉ. देगलूरकर यांची कोटी अशी आहे की वीज चमकते तेव्हा तिला क्षणभर यांचे शिल्पातील मिलन दिसते. त्यामुळे स्वयं लज्जेने तीच ठरवते की येथे नको आणखीन कुठे जाऊन पडू या. यामुळे या देवळांचे विजेपासून संरक्षण होते असा समज असावा.
   वरील सर्व समर्थनांमध्ये सुसूत्रता आढळत नाही. तसेच कामशिल्पे देवळावर कुठे असाबीत यावरही एकवाक्यता नाही. खजुराहोमध्ये अंतरालाच्या (महामंडप आणि गर्भगृह यामधील सुमारे दहा फूट अंतराच्या) बाह्य भिंतीवर ही शिल्पे असतात. या शिल्पांमुळे या भिंतीवरील दोन दगडांमधील बंध हा अधिक घट्ट होतो कारण हे मीलन शारीरिक मीलनाच्या पलीकडचे असल्यामुळे अधिक दृढ असते. परंतु अंतरालाची जागा सोडून अन्यत्रही ही शिल्पे दिसतात.
 अनेक मंदिरातील कामशिल्पे ही अनाकलनीय आहेत. विशेषतः कोणार्कच्या सूर्य मंदिरातील कामशिल्पे ही अत्यंत अग्लील आणि असभ्य वाटतात. त्यांचे प्रयोजन मात्र कळू शकत नाही. खजुराहोमधील कामशिल्पे मात्र संदर्भपूर्ण वाटतात आणि त्यातील बऱ्याच कामशिल्पांचे तार्किक अवलोकनही करता येते. त्यांचे दोन भिन्न स्तर स्पष्टपणे दिसतात. मुख्य मंदिरावरील ठळक शिल्पे आणि मंदिराच्या खालच्या बाजूला किंवा मंदिराखालील चौथऱ्यावरील शिल्पे असे दोन भाग पडतात. मंदिराच्या खालच्या भागावरील काही शिल्पे तर आधीपासून असलेल्या शिल्पांबर परत कोरण्याचा प्रयत्न केल्यासारखी वाटतात. त्यांचे शिल्पांकन इतके निःकृष्ट दर्जाचे आहे की त्यातले कोणती स्त्री आणि कोणता पुरुष हा भेदही कळत नाही. लक्ष्मण मंदिराच्या खालच्या चौथऱ्यावर तांत्रिक साधनेचा एक शिल्पपट आहे ज्याची उंची एक फूट आहे त्यातील आकृती तर. वितभर उंचीच्याच आहेत, परंतु यामध्ये समूह मैथुन, प्राणी मैथुन, विपरीत रती आदीचे शिल्पांकन आहे. हा संपूर्ण शिल्पपट तेथील मूळ झाड उखडून टाकून नंतर बसवलेला असल्यासारखा दिसतो. कारण दहा-बारा फुटाच्या या पटा व्यतिरिक्त त्या मंदिराच्या चौथऱ्याच्या संपूर्ण परिघावर (जवळजवळ ४०० फूट) राज दरबार, शिकारीचे प्रसंग, चतुरंग सेना आदी विविध दृश्ये कोरलेली आहेत. अशा प्रकारे मूळ मंदिरातील शिल्पांवर केलेल्या खोडसाळपणाला शिल्पकलेच्या भाषेत अतिक्रमण (encroachment) म्हटले जाते. परंतु हे केवळ अतिक्रमण नसून तेथे त्यात व्रात्यपणाचीही (vandalism) भर पडलेली दिसते.
   खजुराहोमधील हे शिल्पांकन समजायचे असल्यास, ते तीन स्तरांवर समजून घेतल्यास (स्थूल, सूक्ष्म आणि पर स्तर) ते थोडे सुलभ होते. या पद्धतीने तेथील सगळ्याच कामशिल्पांचा अर्थ लावता येतो असे नाही परंतु बहुतांशी शिल्पे समजू शकतात. त्यातील पहिला स्तर हा शारीरिक असून त्यातील मीलनाच्या विविध अवस्थांचे शिल्पांकन असल्याचे लक्षात येते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, ही कामशिल्पे जरी असली तरी कुठल्याही या विषयक ग्रंथाशी किंवा प्रत्यक्ष कामक्रीडेशी याचा फारसा संबंध नाही. एक तर वात्स्यायन याचा ग्रंथ ही मंदिरे निर्माण व्हायच्या आठ शतकांपूर्वीचा असल्यामुळे त्याचे संदर्भ इथे वापरले असण्याची शक्यता कमी आहे. तसे त्याने वर्णन केलेल्या आसनांपैकी येथे फारच थोडी दिसतात. त्या वर्णनाशी हुबेहूब संबंध तर ओढूनताणून आणावा लागतो. इतकेच नाही तर सर्व कामशिल्पे ही उभी असून त्यातील काही शिल्पात तर शीर्षासन केल्यासारखेही दिसते. यावरून काही अभ्यासकांनी हठयोग आणि कामशिल्प याचाही संबंध लावण्याचा प्रयत्न केला. मंदिराचे स्थापत्य हे ऊर्ध्वगामी असल्यामुळे त्यातील सर्व शिल्पे ही उभीच आहेत. इतकेच नाही तर नर्तकींच्या काही शिल्पांमध्ये तिचे हातही तसेच दाखवले गेले आहेत. उदाहरणार्थ, दोन्ही हात छातीशी धरून कोपरापासून हात जमिनीला समांतर घेण्याच्या मुद्रेला येथे दाखवताना तिच्या डाव्या वाकलेल्या हाताचे ढोपर हे मान वाकडी करून तिने डोक्यावर घेतलेले दाखवले जाते. तर तिचे उजवे ढोपर तिच्या उजव्या गुडघ्याला चिकटलेले दिसते.
   कामक्रीडा ही साधारणतः झोपून करावयाची असल्यामुळे क्रीडारत व्यक्तींना वरून पाहिल्यास त्या जशा दिसतील तसे हे शिल्पांकन आहे. (झोपलेल्या व्यक्तींचे छतावर लावलेल्या कॅमेऱ्याने चित्रण करून ते प्रेक्षागृहातील पडद्यावर दाखविल्यास त्या व्यक्ती पटावर उभ्या असल्यासारख्या दिसतात). खजुराहोमधील ही शिल्पे पाहताना या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे तरच त्यातील अनेक शिल्पांतील अवस्थांचे सहज आकलन होते आणि त्यामध्ये कुठेही हठयोगाच्या मुद्रा नाहीत हे लक्षात येऊ शकते.
    उदा., एका शिल्पात स्त्री आणि पुरुष दोघेही आपापल्या डाव्या पायावर उभे असून दोघांनीही आपला उजवा पाय  दुसर्याच्या कमरेभोवती टाकून अलिंगन दिले आहे. सर्कशीतल्या खेळाडूंना उभे राहून कदाचित हे जमू शकेल अन्यथा हे अशक्यच वाटते. परंतु शिल्पातील दोघे पलंगावर झोपले आहेत अशी कल्पना केल्यास ही क्रिया शक्य आहे हे लक्षात येते. शीर्षासनाच्या अवस्थेचे शिल्पांकनही या दृष्टीने पाहिल्यास ते तसे नसल्याचे लक्षात येते.
    यातील दुसरा स्तर आहे तो कामक्रीडेच्या सूक्ष्म रूपाचे दर्शन घडविणारा. हे समजण्यासाठी मात्र विपुल रसिकता असावी लागते आणि त्या रसिकतेने जीवनातील प्रणयाचे अनुभव समृद्ध झालेले असावे लागतात. खरे प्रेम हे त्या क्रियेपलीकडचे असते. (The real love is beyond the act of love, but to attain it you have to go through it first असे वात्स्यायन याने म्हटले आहे.) या अनुभूतीचे अत्यंत साक्षेपी वर्णन बी कवींच्या (नारायण मुरलीधर गुप्ते) 'चाफा बोलेना' या कवितेमध्ये आहे. कवितेतील ती ऊर्जा म्हणजे चैतन्यहीन जड तत्त्वाला, चाफ्याला जागे करण्यासाठी प्रणयाची अनेक उदाहरणे देते. प्राणी, पक्षी यांच्या प्रणय कथा ऐकून चाफा उत्तेजित होत नाही. मग ती त्याला वैश्कि स्तराच्या प्रणयाचे आव्हान करते. तेव्हा कुठे तो चाफा डोळे किलकिले करतो या कवितेची शेवटची चार कडवी अशी आहेतः

हे विश्वाचे आंगण। आम्हा दिले आहे आंदण ।
उणे करूं आपण दोघेजण ।।
जन विषयाचे किडे। त्यांची धाव बाह्याकडे ।
आपण करू शुद्ध रसपान ।।
दिठी दीठ जाता मिळून । गात्रे आली पांगळून।
अंगी रोमांच आले थरथरून ।।
चाफा फुली आली फुलून। दाही दिशा गेल्या आटून।
कोणी मी- चाफा ! कोठे दोघेजण ?

जोपर्यंत केवळ शरीर प्रक्रियेकडे आणि शरीर क्रियेकडेच सर्वस्व म्हणून पाहत राहू तोपर्यंत किडे (प्राणी) करतात त्या प्रणयात आणि मनुष्यात काही फरकच राहत नाही. परंतु विश्वाचे अंगण उणे पडेल एवढ्या आत्मतृप्तीची अनुभूती जर त्या क्रियेमधून आणि त्यानंतर घेता आली तरच ते मनुष्यत्व ठरेल. कवीच्या ह्या म्हणण्याचे सुरेख शिल्पांकन आपल्याला खजुराहोमध्ये आढळते. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श या पाचही माध्यमातून प्रणयाची अनुभूती घेता येते आणि त्याची उत्कटता प्रसंगी स्पशपिक्षाही अधिक असू शकते. खजुराहोमध्ये या सर्व अवस्थांचे अत्यंत मार्मिक, सूचक आणि तरल शिल्पांकन केलेले दिसते. कुठल्या शिल्पात यापैकी काय आहे हे मात्र केवळ शब्दाने वर्णन करून सांगता येणे शक्य नाही आणि ज्याने त्याने ते आपापले शोधावयाचे आहे. अत्यंत खाजगी अनुभवाचे सामूहिक समानीकरण करणे शक्य नसते परंतु तसा प्रयत्नही केल्यास त्यातून केवळ रसभंगच होण्याची शक्यता अधिक असते.
   खजुराहोच्या कामशिल्पांमध्ये तिसऱ्या स्तराला स्पर्श करण्याचे मोठे आव्हान कलाकारांनी बेललेले आहे. अखेरीस स्त्री पुरुष मीलन किंवा कामक्रियेचे मूलभूत प्रयोजन काय? आणि त्याचे वैश्विक रचनेमधील नेमके कार्य काय ? पुढील पिढी तयार करणे म्हणजे नव निर्माण करणे हे त्याचे खरे प्रयोजन आहे. विश्वामध्येही क्षणाक्षणाला, काहीना काही नवनवीन निर्मिती सुरूच असते. मानवमात्रांना त्याचे आकलन व्हायचे असल्यास निर्मितीच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवातून गेल्याखेरीज ते त्याला सहज अवगत होऊ शकणार नाही ही त्या मागची कल्पना आहे. तत्त्वज्ञानामध्ये जसे दोन घटकांचे अद्वैत सांगितले गेले आहे तीच संरचना अणूच्या रचनेतही दिसते. अणूचे केंद्रक (न्युक्लीयस) आणि त्याभोवती फिरणारा बीजाणू (इलेक्ट्रॉन) ही जशी अणूंची संरचना असून यापासून सृष्टीची निर्मिती होते. संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडविणारी वास्तू ज्याने निर्माण केली त्यांनी त्यामध्ये या सृष्टीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणाचेही शिल्पांकन करून ठेवणे हे स्वाभाविकच होते. कलाकाराने यासाठी कामशिल्पांचे आयोजन केले हे त्याच्या अफाट प्रतिभेचेच लक्षण म्हणावे लागेल. या ठिकाणी त्यांनी केवळ अणूंची संरचनाच नव्हे तर त्याचे कार्यही उद्धृत केलेले दिसते. अणूच्या स्थित्यंतरामध्ये घनीभूत ऊर्जेचा उद्रेक होतो आणि त्यातून जशी निर्मिती होऊ शकते तसा महासंहारक विध्वंसही होऊ शकतो. घनीभूत ऊर्जेच्या उद्रेकाची अनुभूती ही मनुष्यमात्राला काम या एकाच अनुभवातून मिळते. या अनुभूतीचे श्रेष्ठ शिल्यांकन खजुराहोमधील खंडरिया महादेव या मंदिराच्या उत्तर भिंतीवर अंतराळावर असलेल्या तीन शिल्पांमध्ये दिसते. ह्या मंदिरावरील भिंतीवर तीन थरांमध्ये शिल्पे बसवली गेली असल्यामुळे याही शिल्पपटाचे तीन भाग होतात. सलग एका क्रमाने असणाऱ्या कामशिल्पांचा हा एक अत्यंत दुर्मिळ शिल्पपट आहे. हा शिल्पपट समजण्यासाठी याला समांतर अशा रचना पाहणेही आवश्यक ठरते. आश्चर्य असे की अशा प्रकारच्या

चित्र क्र. १७७ : लेणे क्र. ३ बदामी
कल्पकतेची सुरुवात थेट सहाव्या शतकात आढळते. बदामी (कर्नाटक) येथील लेणी क्र. ३ मध्ये असणाऱ्या स्तंभावरील आधारशिल्पांमध्ये (ब्रकेट फिगरमध्ये) आपल्याला हे आढळते. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्या येथील शिलालेखाप्रमाणे ही लेणी इ.स. ५८९ मध्ये पूर्ण झाली असा उल्लेख आहे. या लेण्यांच्या पुढच्या बाजूला सहा स्तंभ आणि दोन अर्ध स्तंभ असून अर्ध स्तंभावर एक-एक आणि मधल्या सहा स्तंभावर प्रत्येकी चार अशी आधार शिल्पे आहेत. यातील पूर्व-पश्चिम (गुहेच्या प्रवेशाची बाजू) बाजूला व्याल किंवा अन्य शिल्पे असून स्तंभाच्या दक्षिण उत्तर भागावर दंपर्तीची किंवा युगलांची शिल्पे आहेत. यांना 'मिथुन शिल्पे' म्हणतात. एकूण चौदा जोडपी यात दाखवलेली असून त्यातील एका स्तंभावर अर्धनारिश्वराचे शिल्प आहे. शेवटल्या तीन शिल्पांची क्रमवारी नक्की ठरवता येत असून अन्य शिल्पे कोरलेल्या क्रमात नसून त्याचा त्यातील युगुलांच्या क्रमाक्रमाने विकसित होणाऱ्या प्रेमालापाप्रमाणे बघावी लागतात. त्यातील पहिले शिल्प हे त्या युगुलाच्या प्रेमकथेची सुरुवात असावी असे वाटते. त्या शिल्पामध्ये तिने त्याच्यासाठी आणलेली भेट त्याला देऊन हळूच त्याची प्रतिक्रिया पाहते आहे. टप्प्याटप्प्याने ती त्याच्याशी लगट वाढवत जाते. परंतु तो मात्र सावध पवित्रा घेऊन असतो. एका शिल्पामध्ये त्याने दगडावर त्याचा डावा पाय ठेवला असून तिने तिच्या उजव्या हाताचे ढोपर सहज त्यावर ठेवून ती उभी आहे. याही शिल्पात त्याने त्याच्या डाव्या हाताने झाडाची फांदी धरलेली असून तिच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नंतरच्या क्रमशः येणाऱ्या शिल्पात तिने तिच्या उजव्या हाताचा पंजा त्याच्या मांडीवर ठेवला आहे, इतकेच नाही तर तिने तिचे ढोपर ताठ केलेले दिसते त्यावरून तिने त्याच्या मांडीवर सूचक असा हलका दाब दिलेला दिसतो. इथे पुरेसा संकेत मिळालेला असल्यामुळे स्वाभाविकच तोही तिच्याशी लगट वाढवतो आणि पुढील शिल्पामध्ये त्याची दोन बोटे हळूच तिच्या स्तनांवर सरकलेली दाखवलेली आहेत. पुढील क्रमचारीतील शिल्पामध्ये याला एक कलाटणी दिलेली दिसते. ती झटक्यात त्याच्या पासून दूर होते, तिच्या उजव्या हाताच्या ढोपराने ती  त्याला ढकलते. जणू काही तिला सुचवायचे आहे मी नाही ग बाई त्यातली! त्यातील पुढच्या शिल्पामध्ये आपल्याला त्याच्या धारिष्ट्याची ओळख पटते. परंतु हे अत्यंत सूचकतेने दाखवलेले आहे. त्यांच्या हातामध्ये रिकामा मद्याचा चषक असून त्या दोघांचेही डोळे थोडे मोठे झालेले असून यावर उत्तेजना आलेली दिसते. इथे ते मद्य प्यायले आहेत असे वरवर दिसत असले तरी वस्तुतः त्या कलाकाराला असे सुचवायचे आहे की त्याने तिला चषकातून मदिरा पाजण्याऐवजी आपल्या ओठातूनच तिच्या ओठात अधरामृत पाजले आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील उत्तेजनेचे ते कारण असावे. तिथे त्याने पत्करलेला धोका हाच त्याच्या पौरुषाची साक्ष ठरतो. पुढील तीन-चार शिल्पांमध्ये उत्तेजित आणि बेभान झाल्यामुळे ती त्याच्यावर जणू काही हल्लाच चढवताना दाखवली आहे. एखाद्या मारामारीप्रमाणे वाटावे असे त्या बेभान झटापटीचे शिल्पांकन आहे. यातील शेवटली तीन शिल्पे मात्र सलग क्रमाने आहेत. एका स्तंभाच्या उत्तरेकडील शिल्पात तिचे ओठ विलग झालेले दाखवले आहेत. याचा अर्थ तिचा श्वासोच्छ्‌वास तोंडावाटे होण्यापर्यंत तिची अवस्था गेलेली आहे. हे अधिक स्पष्ट होण्यासाठी कलाकाराने त्याच्या कल्पकतेची जोड त्याला दिली आहे. तिच्या डाव्या हाताची दोन बोटे विंचवाच्या नांगीसारखी दाखविलेली असून ती त्याच्या छातीवरून हात फिरवत आहे. विंचवाच्या विषाचा दाह जसा सर्वांग जाळतो तसाच कामज्वरानेही शरीराचा दाह होतो. या स्तंभाच्या दक्षिणेकडील भागावर यांच्या मिलनाचे शिल्प अपेक्षित असते. 

चित्र क्र. १७८: स्तंभावरील आधारशिल्प, बदामी

परंतु कलाकाराने येथे थोडा संयम दाखवल्याचे जाणवते. दक्षिण भारतात कोरलेले हे अगदी सुरुवातीचे लेणी मंदिर असल्यामुळे यात उघडपणे कामशिल्प कोरण्याचे त्या कलाकाराने टाळले. त्यांच्या मैथुनशिल्पाऐवजी त्या ठिकाणी त्याने अर्धनारीश्वराचेच शिल्प कोरलेले आहे. इथे त्याचे दोन्ही हेतू साध्य झाले. आधीच्या शिल्पांच्या क्रमामधील मीलनाची शेवटली अवस्था आणि जी पुरुष-प्रकृतीच्या संयोगाचे प्रतीक या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस साध्य केल्या आहेत. हे शिल्प केवळ अर्धनारीश्वराचेच नसून आधीच्याच दंपतीचे कामशिल्पच आहे हे दाखविण्यासाठी या शिल्पाच्या समोरील स्तंभावर त्याने या मालिकेतील शेवटले शिल्प कोरलेले आहे. कामशिल्पांच्या मालिकेतील अत्यंत सूचक तरीपण तेवढेच सुस्पष्ट शिल्पांकन असणारे हे बहुदा जगातील सर्वात श्रेष्ठ शिल्प म्हणावे लागेल. कामक्रीडेच्या प्रचंड उन्मादानंतर त्वरित येणारी सुखद ग्लानी ज्या अवस्थेचे अचूक वर्णन करण्यासाठी संस्कृतमध्ये 'गलितगात्र' असा शब्द आहे. या अवस्थेमध्ये या शिल्पातील स्त्री दाखवली असल्यामुळे त्याने तिला कमरेत हात घालून धरले आहे, त्यामुळेच ती कशीचशी उभी आहे असे दिसते. कारण कामोन्मादानंतर तिच्या पायातले त्राण गेले असल्यामुळे दोन्ही पावले अस्ताव्यस्त झालेली दिसत आहेत. तिचा अंबाडा सुटून केस विस्कटलेले असून तिच्या गळ्यातील माळही तुटली असल्यामुळे त्यातून एक एक मणी पडताना दिसतो. अतिश्रमाने ती थोडी वाकली असून तिची मान त्याच्या खांद्यावर टेकून जड पापण्यांनी ती खाली पाहते आहे. तेथे प्रत्यक्ष पाहत असताना तिच्या कपाळावरील टपटप पडणारे घर्मबिंदू आपल्या अंगावर पडतील की का असे वाटते. या शेवटल्या शिल्पाच्या काही प्रतिकृती करण्याचे प्रयोग अनेक ठिकाणी दिसता पट्टदकल, लंकेश्वर (वेरुळ) आणि अन्य मंदिरातही कुठेकुठे ही शिल्पे दिसतात. बदामीच्या शिल्पाची सर त्यांना येत नाही.
   प्रणयक्रिडेची सुरुवात, त्याचा उत्कट बिंदू आणि त्याची श्रांत स्थिती या तिन्ही अवस्थांचे दर्शन घडविणारे शिल्पांकन आपल्याला खंडारिया महादेव मंदिरामधील उपर्युक्त शिल्पगटात दिसते. यामध्ये पुरुषाचा चेहरा दर्शविलेला दिसत असून स्त्री पाठमोरी दिसते याचा अर्थ पुरुष स्थिर असून सर्व हालचाली स्त्री करते आहे. या शिल्पपटातील तीन शिल्पांना अनुक्रमे वरून खाली पाहताना पहिल्या शिल्पात प्रणयक्रिडेची सुरुवात आपल्याला दिसते, तर दुसऱ्या शिल्पात त्या स्त्रीची गतिमान हालचाल ही प्रणयाच्या उत्कट बिदूला पोहोचलेली दिसते. तिच्या पाठीचे आणि पायांचे ताणले गेलेले स्नायू तसेच तिच्या पाठीला आलेला प्रचंड बाक या अवस्थेचे जिवंत दर्शन घडवतो, तिसऱ्या शिल्पात मात्र त्या शुद्ध रसपानाची अनुभूती घेताना ते दोघे दिसतात. त्यांची संपूर्ण शरीरे आणि त्यातील स्नायू हे पूर्णपणे शिथिल झालेले असले तरीही त्यांचे हात आणि पायाचे आलिंगन अद्याप कायम आहे, इतकेच नाही तर त्यांचे अत्यंत तृप्तीचे चुंबनही त्यामध्ये कलाकाराने दाखवलेले आहे.या शिल्पपटाचा अन्वयार्थ लावणे हे तसे प्रथमदर्शनी कठीणच वाटते. परंतु बृहदारण्यक उपनिषदातील श्लोका- प्रमाणे हे 'आप्मतृप्त आत्मतृप्त आणि शोकविहीन शुद्ध स्वरूप आहे.

चित्र क्र. १७९: कामशिल्पपट, खंडारिया महादेव मंदिर, खजुराह

 याप्रमाणे अणूची संरचना आणि कार्याचे हे प्रतिकात्मक शिल्पांकन असावे. अणू मधील घनीभूत अर्जेचा उद्रेक होऊन महासंहार जसा होऊ शकतो तसाच या घनीभूत ऊर्जेच्या संयमित उद्रेकाने त्यांची प्रक्रिया होऊन नवनिर्मितीही होऊ शकते. निर्मितीसाठी होणाऱ्या ऊर्जेच्या उद्रेकाची अनुभूती मानवी जीवनात कामक्रिडेतूनच होत असते. त्यामुळे याचे रूपक कामशिल्पातून दाखविण्याची असामान्य प्रतिभा या कलाकारांनी दाखवलेली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्री. राजदत्त यांना एक कलाकार म्हणून या शिल्पपटाबद्दल त्यांचे मत काय आहे हे विचारल्यावर त्यांनी दिलेले उत्तर हे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरावे असेच आहे. ते म्हणाले, "शिल्पकलेच्या शास्त्रात यासंबंधी काय असावे हे मला माहीत नाही. परंतु इतक्या अवघड आणि बेधडक अभिव्यक्तींसंबंधी मात्र मी काही सांगू शकतो. अशी कल्पना एखाद्याला सूचणे शक्य आहे. त्याने ती तिथल्या मुख्य स्थपतिला सांगणे ही पुढची पायरी म्हणता येईल. कलाकाराच्या अभिव्यक्तीला सभ्यासभ्य निकषांच्या कल्पनेची कात्री न लावता त्याला ते साकारण्याची अनुमती देणे हे त्याहूनही विशेष. अथक परिश्रमानंतर सर्व कौशल्य पणाला लावून ते कलाकाराला दगडातून हुबेहूच तसेच घडवता येणे ही केवळ दैवी प्रेरणाच करवून घेते. परंतु ज्या दिवशी हा शिल्पपट त्या मंदिरावर प्रत्यक्षपणे बसविला गेला असेल त्या दिवशी त्या शिल्पीला पृथ्वी निर्माण केल्याचा आनंद झाला असेल." माननीय राजदत्तांच्या या उक्तीमुळे असे जाणवते की, जिथे हे शिल्प बसविले गेले आहे ती एका मंदिराची भिंत आहे हे माहीत असूनही असे विलक्षण शिल्पांकन करून अमर झालेल्या त्या कलाकाराला त्या शिल्पाखाली आपले स्वतःचे नाव कोरून जायची गरजच काय ?
   खरंतर अत्यंत अभिमानाने मिरवाव्यात अशा मंदिर नामक वास्तू आणि त्यातील कलाकृती आहेत. परंतु अज्ञानापोटी त्याचे रसग्रहण तर दूरच परंतु ते न समजता त्यावर केवळ टीकाच केली गेली. या शतकामध्ये तरी याचे उचित मूल्यांकन होईल अशी आशा आहे.

  संदर्भ सूची


1. Agrawala Vasudev Sharan, 1965, Indian Art, Prithvi Prakashan, Varanasi.
2. Aryan Subhashini, 1994, Himadri Temples, Indian Institute of Advanced Study, Shimla 
3. Balabantaray Suresh, 2008, ((Pages 19, map 1. plates 76) Yogini Temple Hirapur, Bhubane
Intach Chapter, Bhubaneshwar. 119, 1,
 4. Banerjea Jitendra Nath, 1941, (reprint 1956). The Development of Hindu Iconography, Universi
Calcutta, Calcutta.
5. Baumer Bettina, 1982, Rupa Pratirupa, Biblia Impex Pvt. Ltd. New Delhi
6. Bhat G. K. 1975, Bharafa-Natya-Manjari, Poona, Bhandarkar Oriental Research Insititute.
7. Biswas T. K. and Jha Bhogendra, 1985, Gupta Sculptures, Banaras Hindu University, Varanasi
8. Bose D. M., Sen S. N. and Subbarayappa B. V. (Editors), 1971, A Concise History of Science in Indian National Science Academy, New Delhi
9. Capra Fritjof, 1982, The Tao of Physics, Flamingo, UK
10. Chennakesavan Sarasvati, 1980, A Critical Study of Hinduism, Motilal Banarasidass Publishers Pyr Ltd., Delhi
11. Comfort Alex, 1966, The Koka Shastra, London, Tandem Books Limited.
12. Coomarswamy Anand K., 1914, (Reprint 2000), The Eight Nayikas, Mushiram Manoharlal Publishers Pvt. Ltd., New Delhi
13. Coomarswamy Anand K., 1969, (5" reprint 2008), Introduction to Indian Art, Munshiram Manoharis Publishers Pvt. Ltd., New Delhi, Reprint, (Pages xi, 104, Plates 43).
14. Daftari K. L., 1942, The Astronomical Method And Its Application To The Chronology of Ancient Indis Nagpur University Office, Nagpur. (Pages xvii, 257).
15. Dahejia Harsha, Indurkar Udayan and others, 2017, Amarushatakam, D. K. Printworld Pvt. Ltd, New Delhi
16. Danielou Alan, 1991, Myths and Gods of India, Inner Tradition International, USA
17. Danielou Alan, 2001, The Hindu Temple-Deification of Eroticism, Inner Tradition International, USA
18. Deglurkar G. B., 2004, Portrayal of The Woman, Publication Scheme, Jaipur
19. Desai Devangana, 1974, (Reprint 1985), Erotic Sculpture of India, Mushiram Manohartal Publishers
Pvt. Ltd., New Delhi. 20. Desai Devangana, 1996, The Religious Imagery of Khajuraho, Mumbai, Franco-Indian Research Pvt. Ltd.
21. Desai Kalpana, 1973, Iconography of Visnu, Abinav Publications, New Delhi,.
22. Desai Vidisha and Mason Danielle, 1993, Gods, Guardians and Lovers, The Asia Society Galleries, New
York and Mapin Publishing Pvt. Ltd., Ahmedabad,
23. Deshmukh B. S. 1987, Iconography of Hindu Temples in Marathwada, Publication Scheme, Jaipur 24. Deva Krishna, 1996, The Temples of India, Aryan Books International, New Delhi
25. Dhal U. N., 2000, Shiva Purana (Uttarakhanda), Nag Publishers, Delhi
26. Dimmit Comella and J.A.B. van Buitenen, 1978, Classical Hindu Mythology, Temple University Pres USA
27. Donaldson Thomas, 2003, Monumental Legacy Konark, New Delhi, Oxford University press
28. Doniger Wendy, 1975, Hindu Myths, Penguin Books, U.K.
20. Eck Diana L., 1981, Dershan, Seeing the Divine Image in India, Anima Books, USA 20. Gonda Jan, 1965. CT Edition sing the Divine in India. Anima Books, Austin Marat
Publishers Pvt. Ltd., New Delhi. 32. Gonda Jan. 1984. The Viaext of the Vedic Poets. Mushiram Manohartal Publishers Pvt.Ltd. New Delhi
33 Hariyanna M 1993. (4 edition 2005. Mushiram Manohara Pula Banarsidass, New Det 32 Hinde Jan, 1905, Vanuatu Vedic Poets. Mushiram Pet New

१९२ / प्राचीन मंदिक्ष, मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे
   3. Hiriyanna M. 1995, (Reprint 2000), The Essentials of Indian Philosophy, Motilal Banarasidass, New Delhi Huntington Susan, 1985, The Art of Ancient India, John Whetherhil, USA
36. awin John, (Essays selected by), 1983, The Ancient Indian Cosmogony, Vikas Publication House, New Delhi. (Kuiper F8J: Three Strides of Vishnu, pp. 41-55).
Jain-Neubauer Jutta, 1981, The Stepwella of Gujarat, Abhinav Publications, New Delhi 38. Kaul Advaitvadini and Chattopadhyay Sukumar Eds., 1999, Kalatattvakoša (Vol. IV), Indira Gandhi National Centre for Arts, New Delhi and Motilal Banarasidass Publishers Pvt. Ltd. Delhi,

39. Keay John, 1981, India Rediscovered,, Harper Collins Publishers, London
20 Krishna Deva, 1969, The Temples of North India, New Delhi, National Book Trust
41. Mani V.G., 1995, Saptamatrikas in Indian Religion and Art, Mittal Publications, New Delhi
22 Mankodi Kirit, 1991, The Queen's Stepwell at Patan, Mumbai, Franco-Indian Research Pvt. Ltd.
25 Mathpal Yashodhar, 1984, Prehistoric Rock-Paintings of Bhimbetka, Abhinav Publications, New Delhi
44. Misra O. P., 1989, Iconography of the Saptamatikas, Agam Kala Prakashan, Delhi 45. Mitra Debala, 1957, (7" reprint 2001), Sanchi, Archaeological Survey of India, New Delhi
46. Muller Max (Editor), 1965 (3 edition), Vol. 1, The Hymns of the Rig-Veda, Chaukhamba Sanskrit Services Office, Varanasi
47. Nagaswamy R., 2010, Brhadīśvara Temple, New Delhi, Indira Gandhi National Center for Arts and Aryan Books International.
48. Parimoo Ratan, Kannal Deepak, Panikkar Shivaji, (Editors), 1988, Ellora Caves: Sculptures and Architecture, New Delhi, Books and Books
49. Pierre Pichard, 1995, Tanjavur Brihadeeshvara, Indira Gandhi National Center for the Arts, Delhi and EFEO, Pondicherry 50. Prakash Vidya, 1967, Khajuraho, Taraporewala's D. B. Taraporewala and Sons & co Pvt. Ltd. Bombay
51. Prasad Hari Shankar Ed., 1992, Time in Indian Philosophy, Shri Satguru Publications, Delhi, (Pages 740).
52. Radhakrishnan S., Hindu Philosophy, Oxford Press, Delhi, 1923, (9" edition 2002). Vol. II. (pages 807).
53. Rai Ram Kumar, 1983, Encyclopedia of Indian Erotics, Prachya Prakashan, Varanasi.
54. Rao Gopinath TA., 1914, Elements of Hindu Iconography, The Law Printing House, Madras
55. Ray Nihar Ranjan, 1973, Idea and Image in Indian Art, Munshiram Manoharlal Publisheres Pvt. Ltd..
New Delhi
56. Sarma I. K. Ed. 1819, ( Reprint 1988), The Iconology of Hindus, Caxton Publication, Delhi,
57. Seely John B. 1825, The Wonders of Ellora, Geo. B. Whittaker, London
58. Shastri J. L. (Translator), 1951, (Reprint 1990), The Linga Purana, Motilal Banarasidass Punlishers Pvt. Ltd., Delhi
59. Shivananda Swami, 1962, (Reprint 1990), Sixty-Three Naynar Saints, ADivine Life Society Publication, UP
. Shivaramamurti C., 1952, (5" reprint 1992), Mahabalipuram, Archaeological Survey of India, New Delhi.
60 61. Shivaramamurti C., 1960, (5" reprint 1992), Chola Temples, Archaeological Survey of India, New Delhi.
62. Shivaramamurti C., 1974, Nataraja in Art, Thought and Literature, National Museum, New Delhi.
63. Shivaramamurti C., 1981, Time in Indian Art, The Mythic Society, Bangalore.
64. Shwaller de Lubicz R. A., 1998, The Temple of Man, Inner Tradition International, USA
65. Singh Upinder, 2009, (Reprint, 2012), A History of Ancient and Early Medieval India, Pearson Longman,
Delhi. 66. Soundara Rajan K. V., 1981, Cave Temples of the Deccan, New Delhi, Director General, Archaeological
Survey of India. 87. Tilak B. G., 1893, (Reprint 2008), The Arctic Home in the Vedas, Messrs. Tilak Brothers, Pune
68. Vatsyayan Kapila Ed., 1996, Concept of Space (Ancient and Modern), Indira Gandhi National Centre for
Arts, New Delhi 69, Vatsyayan Kapila Ed., 1996, Concept of Time (Ancient and Modern), Indira Gandhi National Centre for Arts, New Delhi.

संदर्भ सूची

/ १९३
[08/06, 11:06 pm] Swapnil Jirage: To Vayayan (Translated) Kamasutra, Lancer Books
71. Wilson Hayman Horace (Translator), 1864, (Vol. 1), The Vishnu Purana - A System of Hindu Mything and Traditiort, Trubner & Co., London Heinich, Ed Joseph Campbell 1990, Myths and Symbols in Indian Art and Civilization

Banarasidass Publishers Pvt. Ltd. Delhi.

१. आपटे मोहन, २००२, कृष्णविवर, राजहंस प्रकाशन, पुणे
२. आपटे मोहन, २०१०, कालगणना, राजहंस प्रकाशन, पुणे
३. इंदुरकर उ. अ., २००१, द्रष्टा कलासाधक, पुणे, अमृतसिद्धी प्रकाशन 
४. इंदुरकर उ. अ., २००७, अद्भुत भारतीय शिल्प वेरूळ, पुणे, अनंत प्रकाशन
५. कळसेकर, १९९७, खिद्रापूर, पुणे, कळसेकर प्रकाशन
६. काळे रामचंद्र मोरेश्वर, अनुवादक, १९४७, मेघदूतम्, मुंबई, गोपाळनारायण आणि कंपनी 
७. कुलकर्णी वि. य., १९९६, भारतीय कलाः उद्रम आणि विकास, पुणे, सुयोग प्रकाशन
८. गोखले शोभना, १९७५, पुराभिलेखविद्या, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
९. चित्राव सिद्धेश्वरशास्त्री (अनुवादक), १९६९, ऋग्वेदाचे मराठी भाषांतर, भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे
१०. जोगळेकर स. आ. (संपादक), १९५६, (४थी आवृत्ती २०१३), गाथा सप्तशती, प्रसाद प्रकाशन, पुणे
११. जोशी नी. पु.. १९७९ (२री आवृत्ती २०१३), भारतीय मूर्तिशास्त्र, पुणे, प्रसाद प्रकाशन
१२. जोशी प्र. न., १९८६ (पुनर्मुद्रण १९८८), सार्थ श्रीवाल्मीकिरामायण, पुणे, विदर्भ मराठवाडा बुक कंपनी
१३. जोशी महादेवशास्त्री, १९७०, भारतीय संस्कृतीकोश (खंड १-१०), पुणे, भारतीय संस्कृतीकोश मंडळ
१४. धावरे पंढरीनाथ काशिनाथ (अनुवादक), (खंड १ आणि २) १९६१, श्रीमद्भागवतमहापुराणम्, गीता प्रेस, गोरखपूर
१५. दात्ये रोशन, २०१०, कथक-आदिकथक, मुंबई, ग्रंथाली प्रकाशन देगलूरकर गो. ब. २००४, सुरसुन्दरी, पुणे, भारतीय विद्या भवन
१६. १७. देगलूरकर गो. बं., २००७, विश्णुमूर्ते नमस्तुभ्यं, श्रीद्वारकाधीश चॅरिटीझ, कर्नाळा
१८. देगलूरकर गो. ब., २००८, वेरूळ दर्शन, पुणे, स्नेहल प्रकाशन १९. देगलूरकर गो. बं., २०१४, शिवमूर्तये नमः, पुणे, स्नेहल प्रकाशन
२०. देगलूरकर गो. बं., २०१६, कोप्पेश्वर (खिद्रापूर), पुणे, स्नेहल प्रकाशन
२१. देव शां. भा., १९७६, पुरातत्त्व विद्या, पुणे, कांटीनेंटल प्रकाशन
२२. द्विवेदी आचार्य शिवप्रसाद (अनुवादक), २०१२, श्रीविष्णुमहापुराणम्, चौखम्बा सुरभारती प्रकाशन, वाराणसी
२३. प्रभुदेसाई प्र. कृ. १९६७, आदिशक्तीचे विश्वरूप, देविकोश प्रथम खंड, पुणे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ
 २४. बड़े राजा, पद्यानुवाद, मंगरुळकर अरविंद गद्यानुवाद, १९८४, शेफालिका (गाथा सप्तशती अनुवाद), मुंबई महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ
२५. माटे म. श्री., १९६४, मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, वोरा आणि कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.
२६. बीस्कर पु. न.. (अनुवादक), १९९३, श्रीशिवमहिम्नस्तोत्रं, पुणे, चैतन्य साहित्य
२७. साखरे श्रीनानामहाराज, (अनुवादक), १९८६, सार्थ श्रीज्ञानेवरी, पुणे, सारथी प्रकाशन
२६. सातवळेकर श्रीपाद दामोदर (संपादक), १९४७, ऋग्वेद संहिता, भारत मुद्रणालय, औंध, जि. सातारा, हणमंते श्रीधर शामराव, १९५८, (४थी आवृत्ती २००४), संख्या- -संकेत कोश, प्रसाद प्रकाशन, पुणे





























































































































































































































































































































































Sun sculpture found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh on 30-10-2020 and its significance.

Sun sculpture found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh on 30-10-2020 and its significance.

Suryadeva / Sun God sculpture found on 30-10-2020: A sculpture of Sun God has been found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh, G Shiva Kumar, Joint Secretary, Rayadurgam Heritage Association said on Friday, 30-10-2020[1]. According to the officer, Nagendra, a farmer of the village was digging his field on Friday and the two feet high stone sculpture was found[2]. Kumar came to know of it, visited the field, took photographs and sent them to Em Sivanagi Reddy, a historian and CEO of Cultural Centre of Vijayawada and Amaravati (CCVA)[3]. Reddy in his observations said that the sculpture found on the banks of river Vedavati is that of Surya, the Sun God who has lotus in both hands[4]. It is in the architectural style of Nolamba Pallavas and dates to 10th century AD, he added[5]. It is unbelievable and astonishing as to why historians are still using AD, BC etc., in India. As the stone sculpture was found in the field, the landowner informed the matter to village Revenue Officer Hanumanta Rao[6]. Gummagatta Mandal Tehsildar Venkatachalapati informed the matter to the higher authorities[7]. Local police also visited the site[8]. A priest from nearby temple performed “pooja” to the idol. Kumar requested the officials to preserve the statue and place it in the Government Museum Anantapur. So, the entire process has been ritualized by the concerned authorities / persons in their own way. Of course, this news, obviously picked up from “The Hindu,” has been repeatedly appearing in other media.

According to Vedveer Arya, the date could go to the Satavahana period: However, certain researchers claim that the date of the sculpture could go beyond the medieval period[9]. Vedveer Arya says[10], “An inscribed stone inscription was found to the north of this site. This inacription belongs to the Nolamba king Maydammarasa. It is written in Kannada language and Telugu-Kannada characters of 2nd cent CE. Interestingly, it mentions the death of a person Kilgunte (self-sacrifice of a person for the death of his master). But this inscription has no link with the sculpture of Sun God. The art of the sculpture indicates the period of Shatavahanas or Ikshvaku kings of Andhra.” It has to be verified that inscriptions with “Kannada language and Telugu-Kannada characters of 2nd cent CE,” have been found and recorded in the Epigraphica Karnataka and Epihgraphia Indica volumes.

Nolumba temple complex at Amaravati, Anatapur: There has been a Doddeswara temple complex of the Nolumbas at Hemavati, with many temples / sannidhis inside. Many of the sannidhis have been in a ruined condition. A museum is nearby, where, hundreds of broken sculptures are kept inside and outside the museum building.  The broken sculptures are found in and around the temple complex, in the fields and nearby remote places. Sivaramamurti noted[11], “Surya, however, as in the case of regular Chalukya figures, has amazons, warlike figures with bow and arrow, flanking him, driving out darkness by shooting it out (pl. XXXVI). This feature is invariable the case of Surya in northern sculpture, a tradition followed by the Chalnkys sculptors but not by the Tamil school (pi. XXXVIIIa), where always Surya stands in solitary glory. He is, however, bare-footed, as, in spite of the penetration and absorption of other northern traditions in the Chalnkya school, the top-boots of Surya are absent”. Douglas Barret[12] also noted that, “To the right of the Surya (plate.13) stands a broken pillar with a long Kanarese inscription which mentions the greatest of the Nolamba rulers.” Shama Sastry[13] has also pointed out. Therefore, if the period of the inscriptions is to be equated with the nearby sculptures, then, the dates have to be changed. In India, the sculptures are dated relatively either based on the style, or the inscriptions found on them or nearby. And this has been the practice for more than 150 years by the European Indologists, followed by the Indian counterparts.

The second Nolamba Surya sculpture in the Madras museum: Sivaramamurti, described about another Nolamba Suya sculture in the Madras museum[14], “This most elaborately worked image of Surya (pl. V) in high relief is a great masterpiece of Nolamba art. In this all the elaborate patterns of ornamentation in Nolamba sculptures can easily be observed. The kirita is elaborate and of the karanda type with profuse ornamentation. Makara-kundalas adorn the ear lobes. There are elaborate courses of neck ornament, the bottom-most with mango-shaped pendants with an amount of decorative work covering his entire chest. Ornamental tassels are present on the shoulders and elaborate keyuras on his arms. ………Both the arms of the figure and the lotuses held in the hands are broken and lost. This is one of the finest examples of Surya of this period. The udarabandha is very elaborately worked as a band with a course of tassels suspended in a row all along..” Though, he noted that, “Both the arms of the figure and the lotuses held in the hands are broken and lost,” he has not given any reason for breakage and loss. Incidentally, Rajendra Chola had come here and taken away 50 pillars from the Doddeswara temple, proving that the temple complex was in shambles and deserted .

About the Fifty Nolamba Pillars[15]: About this, also C. Sivaramamurti gives the details: At Tiruvaiyar seven miles from Thanjavur, is an ancient Chola temple adjunct of which is the Apparsvami shrine. This small temple is associated with the great Saiva – saint who converted the Pallava king Mahendravarman to Saivism and the sacred spot has a temple erected by Rajendra (1014-1044 CE). An inscription on the plinth gives the prasasti of Rajendra Chola. Around the temple are corridors with rows of pillars. There are about fifty exquisitely carved pillars in greenish basalt with intricate carving in a style so different from all around that they stand out distinctive entirely variant from their surroundings[16]. These are in fact Nolamba pillars brought as war trophies by the great connoisseur of art Rajendra, as considered by the historians.

Comparison of the three Surya sculptures: If all the three are Nolamba sculptures, then, they can be compared. Why the Nolambas of the same dynasty, period and sculptors of the sculptures in question should vary in the style, character and form of them? Whether he sculptors changed or they had been ordered to do so, has to be critically analyzed.

Surya sculpture at the Madras MuseumSurya sculpture at the Hemavati  MuseumSurya sculpture discovered now in 2020
Northern style/ Hoysala style. Face exhibits distinguishable Gupta features.NormalRegular feature May be resembling Surya Narayana.
Elaborate ornamentationNormal. Two female devatas are found at the feet oneither side of the legs.Simple, the sacred thread is prominently visible. Holding two lotuses with cords.
`123Broken condition, two upper hands are missing.Broken condition, two upper hands are missing. Here, the outer prabha portion is seen in broken condition.It is with two hands, no indication of other two hands. Others portions might have been broken.

Therefore, it is clear that the three sculptures differ in many iconographical factors and therefore, they cannot belong to the same period. Here, the Sun God has been found in an agriculture field at Kalugodu village, Gummagatta Mandal of Anantapur district in Andhra Pradesh, in buried condition. Therefore, it is implied and evident that it was buried as it was mutilated and cannot be worshipped in a temple. Many idols were left in field and remote places “as is where is condition,” as they were defiled by the mlechas.

Why the sculptures are found in broken condition?: After 10th century, as Malikafur invaded Southern India, during 1309-1311, he ransacked many temples and looted wealth. Therefore, he could have gone to Hemavati area and plundered. In 1309, Alauddin sent Malik-Kafur on an expedition to the Kakatiya kingdom and Kafur’s army reached the Kakatiya capital, Warangal, in January 1310, and breached its outer fort after a month-long siege. The Kakatiya ruler, Prataparudra, surrendered and agreed to pay tribute. Kafur returned to Delhi in June 1310 with a huge amount of wealth obtained from the defeated king.The Koh-i-Noor diamond was said to be among the loot.  He led another expedition of looting set off on 19 October 1310, and reached the extremity of peninsular India. On 25 February 1311, Kafur besieged Dwarasamudra, and looted. Kafur proceeded to the Pandya kingdom, where he raided several places, obtaining much treasure and many elephants and horses. Kafur occupied Madurai on 24 April, and reached Delhi in triumph on 18 October 1311.

The Sun temple must have existed there: The hundreds of broken sculptures in the Hemavati  museum prove that many temples must have been destroyed and thus, the broken sculptures were brought and dumped there inside and outside. The sculptures and idols Saptamata and other goddesses strewn here and there, show that a Sakti temple was destroyed. The other sculptures related to tantric worship implies that such temple was also destroyed. The Sun sculpture and other broken Navagraha sculptures prove the existence of a Sun temple. Therefore, the existence of Sun temple there proves the Sun worship. Even the broken sculpture at Sangameswarar temple, Alampur  complex prove.

© K. V. Ramakrishna Rao

03-11-2020.


[1] The Hindu, Stone idol of Sun God discovered, Special Correspondent, ANANTAPUR , OCTOBER 31, 2020 11:47 IST; UPDATED: OCTOBER 31, 2020 11:47 IST.

[2] https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/stone-idol-of-sun-god-discovered/article32989153.ece

[3] Business World, 10th Century Sun God Sculpture Found In Agriculture Field In Andhra Pradesh, by ANI, 31October, 2020

[4] http://www.businessworld.in/article/10th-Century-Sun-God-sculpture-found-in-agriculture-field-in-Andhra-Pradesh/31-10-2020-337665/

[5] India TV News Desk, Andhra village farmer finds 10th century Sun God sculpture while digging agricultural field, New DelhiPublished on: October 31, 2020 9:13 IST

[6] https://www.indiatvnews.com/news/india/10th-century-sun-god-sculpture-found-andhra-pradesh-agricultural-field-661262

[7] ZeeNews, 10th Century Sun God sculpture found in agriculture field in Andhra Pradesh, October 31, 2020.

[8] https://www.zee5.com/zee5news/10th-century-sun-god-sculpture-found-in-agriculture-field-in-andhra-pradesh/

[9] MyIndiaGlory, Sculpture of Sun God discovered in Andhra Farmland: 2000+ year old?, October 31 2020.

[10] https://www.myindiamyglory.com/2020/11/02/sculpture-of-sun-god-discovered-in-andhra-farmland-2000-year-old/

[11]  C. Sivaramamurti, Nolamba Sculptures in the Maddras Government Musuem, Bulletin on the Madras Government Museum, New Series, General Section, Vol.IX, No.1, 1964, p.12.

[12] Douglas Barret, Hemavati, Bhulabhai Memorial Institute, Bombay, 1958.

[13] R. Shama Sastry, South Indian Inscriptions (Texts), Vol..IX, Part-I, Madras, 1939, No.19, pp.8-9.

[14]  C. Sivaramamurti, Nolamba Sculptures in the Maddras Government Musuem, Ibid, p.16.

[15] K. V. Ramakrishna Rao, The Nolamba Temple Pillars brought by Rajendra Chola from Hemavati to Thanjavur, Proceedings of the 41st Session of Andhra Pradesh History Congress , Anantapur, 2017, pp.

[16] C. Sivaramamurti, Nolamba Sculptures in the Madras Government Musuem, opt.cit, pl. XXV.

https://kvramakrishnarao.wordpress.com/2020/11/04/sun-sculpture-found-in-an-agriculture-field-at-kalugodu-village-gummagatta-mandal-of-anantapur-district-in-andhra-pradesh-on-30-10-2020-and-its-significance/



No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...