Friday, June 21, 2024

आणखी काही मुर्ती

 

ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे

ब्रम्हदेव, सिद्धेश्वर राम मंदिर, ठाणे

हि मूर्ती काही वर्षांपूर्वी सिद्धेश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्ती साधारणपणे ८व्या शतकातील म्हणजे शिलाहारकालीन आहे. महाराष्ट्रात शिलाहारांच्या ३ शाखा – उत्तर कोकणाचे शिलाहार, दक्षिण कोकणचे शिलाहार आणि कऱ्हाड / कोल्हापूरचे शिलाहार. आता काहींना प्रश्न पडेल, शिलाहारांच्या तीन शाखा, मग हि मूर्ती कोणत्या शिलाहार शाखेने तयार करून घेतली आणि ती कोणत्या मंदिरात होती?

उत्तर कोकणचे शिलाहार या राजघराण्याने हि मूर्ती तयार करून घेतली. याच राजघराण्याने इ.स.१०६० मध्ये अंबरनाथचे सुप्रसिद्ध शिवमंदिर बांधले. हे राजघराणे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक. इ.स. ८०० ते १२५० अशा साधारणपणे ४५० वर्षांचा त्यांचा काळ. या शिलाहार राजांची राजधानी होती श्रीस्थानक (सध्याचे ठाणे).

सिद्धेश्वर तलाव परिसरात ब्रम्हदेवाचे मंदिर असावे आणि हि मूर्ती त्या मंदिरातील गाभाऱ्यात असावी. तसेच मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले असावे आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्तीला वाचवण्यासाठी तिला मंदिराजवळ असलेल्या तलावात (म्हणजे आताच्या सिद्धेश्वर तलावात) लपवून ठेवली असावी.

ह्याचाच अर्थ असा निघतो कि ८व्या शतकापर्यंत महाराष्ट्रात ब्रम्हदेवाची पूजा होत होती. अशीच दुसरी एक ब्रह्मदेवाची मूर्ती नालासोपारा येथील मंदिरात आहे.
मूर्ती सुमारे ५ फुट उंच आणि उभी आहे. मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे हातात काय असावे हे कळायला मार्ग नाही. मुर्तीशास्त्राप्रमाणे अक्षमाला, वेद, कमंडलू आणि माला असावी. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर चौथे डोके मूर्तीच्या मागच्या आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे. डोक्यावर अप्रतिम कोरीवकाम केलेला मुकुट आहे. कानात कुंडले असून जानवे आणि करगोटा धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मुर्तीच्या उजव्या बाजूला सावित्री आणि डाव्या बाजूला सरस्वती खोदलेली आहेत. दोन्ही बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर प्रभावळ आहे.
http://maharastramandirbynikhilaghade.blogspot.com




शिव किरात - संजय सोनवणी.

✍️
शिव हा परंपरेने जसा योगी मानला गेला आहे तसाच तो शिकारीही (किरात) आहे. हरप्पा येथील पट्टीकेत शिवाची ही दोन्ही रुपे चित्रीत केली गेली आहेत. बारकाईने पहा, शिकारी शिवाच्या हातात त्रिशुळाचे आद्य रूप आहे (दोन फाळ वरच्या दिशेऐवजी खालच्या दिशेने आहेत) शैव संस्कृतीचे हे सुस्पष्ट पुरातन पुरावे आहेत...जी आजही जपली जात आहे.
✍️
- संजय सोनवणी,

l

मंदिरात लिबरल धोरण

l

अग्नीचा एडका, कुबेराचा मुंगूस, इंद्राचा ऐरावत.... ही वाहनसाखळी ठरवतांना काही लॉजिक असते का मूर्तिशास्त्रात ?

अर्थातच.
उदा. यज्ञात अग्नीला हवि अर्पण केला जातो. तो मुख्यतः बोकडाशी संबंधित असल्याने एडका हे अग्नीचे वाहन ठरवले गेले. " अजापुत्रम बली दद्यात" हे तर प्रसिद्धच आहे. वायूचे वाहन हरीण हे हरिणाच्या वेगाने धावण्याच्या असलेल्या पद्धतीमुळेच बनवले गेले. ऐरावत हा समुद्रमंथनातून बाहेर पडला आणि इंद्रानेते वाहन म्हणून स्वीकारले. वरुण ही जलदेवता, साहजिकच मगर हे त्याचे वाहन झाले.
येथे एक नमूद करावेसे वाटते, कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.

एकंदरीत त्या त्या देवतांच्या स्वभावामुळे किंवा पौराणिक कथेत असलेल्या प्रसंगामुळे त्या त्या देवतांना विशिष्ट वाहने मिळाली आहेत.

कुबेराचे वाहन हे मुंगूस नव्हे, मुंगूस हे धनाचे प्रतीक असल्याने ते कुबेरासोबत असते. कुबेर हा नरवाहन. तो यक्षांचा अधिपती.
वल्ली उर्फ प्रचेतस, कुबेर या विषयावरच अधिक माहिती देणारा धागा काढावा ही विनंती ! तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !
धागा नेहमी प्रमाणेच उत्तम आहे ! :)

जाता जाता :- का कोणास ठावूक परंतु लोक दिवाळीत लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कुबेर पुजन करायचे विसरत चालले आहेत का ? असे वाटते.
या दिवशी गणपती-लक्ष्मी आणि कुबेर यांचे पुजन एकत्रीत करणे महत्वाचे असते.

तुम्ही दिलेल्या फोटोत धनाची थैली आणि मुंगस मला का दिसत नाही ते कळेना !

कुबेराच्या खांद्यावरुन डोक्यावरुन जाणारी एक फुगीर भाग असलेली लांबलचक माळ दिसेल तीच धनाची थैली. ह्याच्या एका टोकाला मुंगुसाचे शिर व दुसर्‍या टोकाला फुगीर भाग दाखवलेला आहे तीच धनाची थैली.



२४ अवतार म्हणजे २४ रुपांतरे. शंख, चक्र, गदा, पद्म या लक्षणांच्या क्रमानुसार त्यांची विविध नावे ठरतात.
उदा.
केशव- (डावीकडून)पद्म, शंख, चक्र, गदा
नारायण - शपगच
माधव-गचशप

अशी गोविंद, विष्णू, मधूसूदन अशी संध्येतील २४ नावे.


http://www.misalpav.com/node/50494















वैनायकी – योगिनी, शक्ती की मातृका?
पंकज समेळ,
गणपती हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. गेली अनेक शतके ह्या देवतेने आपल्या मनावर भुरळ घातली आहे. गजमुख, लंबोदर, उजव्या हातात लाडू आणि पायाजवळ उंदीर हे गणपतीचे रूप आपल्या मनात पक्के बसले आहे. परंतु, जर असे सांगितले, गणपती जसा पुरुषरुपात असतो, तसाच तो स्त्रीरुपात देखील असतो तर. आज आपण सर्वसामान्यांना अपरिचित अशा स्त्रीरूपातील गणपतीची अर्थात वैनायकीची थोडक्यात माहिती करून घेऊया आणि महाराष्ट्रातील वैनायकी मूर्तींची ओळख करून घेऊया.
निसर्गाने स्त्रीला गर्भधारण करण्याची शक्ती दिली आहे. त्यामुळेच अनादी कालापासून मानवाने स्त्रीला शक्तीरुपात पुजण्यास सुरुवात केली. संकटाच्या काळात पुरुष स्त्रीकडे ऊर्जास्त्रोत म्हणून पाहत आलेला आहे. पण ती शक्ती किंवा ऊर्जा सहचारिणीच असली पाहिजे असा काही नियम नाही. ती शक्ती किंवा ऊर्जा कोणीही असू शकते. अनादी कालापासून शक्ती म्हणजे स्त्री असे समीकरण चालत आले आहे. मूर्तीशास्त्रानुसार कोणत्याही देवतेची शक्ती दाखवताना संबंधित देवतेची मूर्ती स्त्रीरुपात दाखवली जाते.
भारतीय मूर्तिशास्त्रात विनायक किंवा गणेशाची शक्ती असलेल्या वैनायकी किंवा गणेशानी बद्दल फार कमी माहिती वाचायला मिळते. वैनायकी देवता विनायकी, विघ्नेश्वरी, गणेशानी, गणेश्वरी, गजानना, गणपतीहृदया इ. विविध नावांनी ओळखली जाते. ह्या देवतेचा उदय कधी झाला ह्याबद्दल निश्चित माहिती नाही. मध्यकाळात हिंदूधर्मातील पाच मुख्य देवतांपैकी एक म्हणून गणपतीची उपासना होण्यास सुरुवात झाली आणि त्याचबरोबर उदयाला आलेल्या गाणपत्य संप्रदाय आणि योगिनी संप्रदाय यांच्यामुळे वैनायकी देवतेला महत्त्व प्राप्त झाले असावे. एच. डी. भट्टाचार्य यांच्या मते गणेश मुख्य देवता म्हणून पुजला जाऊ लागला त्याच वेळी गणेशाची शक्ती गणेशानी हिची पूजा होऊ लागली.
काही पुराणांनी वैनायकीचा उल्लेख योगिनी म्हणून केला आहे. स्कंदपुराणाच्या काशीखंडात (४५वे प्रकरण) व्यासऋषी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्कंदऋषी चौसष्ट योगिनींची नावे सांगतात आणि त्यातील पहिले नाव गजानना आहे. मत्स्यपुराणामध्ये २०० स्त्रीदेवतांचा उल्लेख आहे आणि वैनायकी त्यापैकी एक आहे. पण अग्नीपुराणात उल्लेखलेल्या योगिनींच्या नावामध्ये वरील एकाही नावाचा उल्लेख नाही आहे. देवी-सहस्त्रनाम ग्रंथात देवीच्या एक हजार नावांचा उल्लेख केला आहे. त्यात विनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी ह्या तीन नावांचा उल्लेख आला आहे. रिखिआन (१०वे शतक), बेडाघाट (११वे शतक), हिरपूर, झारिआल (१०वे शतक) येथील चौसष्ट योगिनी मंदिरांमध्ये इतर योगिनींच्या बरोबर वैनायकीसुध्दा आढळून येते. भारतीय संग्रहालय, कोलकाता (The Indian Museum, Kolkata) येथे मध्यप्रदेशातील सतना येथे सापडलेल्या योगिनींचा समूह जतन करून ठेवला आहे. या योगिनी समुहातील सिंहारूढ श्री वसभा (श्री वृषभा) ही योगिनी वैशिष्ठ्यपूर्ण आहे. श्री वृषभा योगिनीच्या मांडीवर विनायक आणि डाव्या पायाजवळ वैनायकीची मूर्ती आहे. मूर्तीच्या मागील दोन हातात कमळ आणि फुलआणि पुढील उजव्या हातात तुटलेली गदा आणि डाव्या हातात मोदकपात्र असावे (असावे ह्याच्यासाठी कारण हा हात नष्ट झालेला आहे).
श्री वसभा (श्री वृषभ) आणि वैनायकी (१०वे शतक), भारतीय संग्रहालय, कोलकाता वैनायकी आणि इतर योगिनी (१०वे शतक), रीखीआन, उत्तरप्रदेश
वैनायकी (१०वे शतक), चौशष्ट योगिनी मंदिर, हिरापूर, ओरिसा
जैन धर्मातसुध्दा योगिनींपैकी एक म्हणून वैनायकीची उपासना केली जात होती. जैन मंदिर, बडोदा येथील हंस विजय संग्रहात चतुष्षष्टियोगिनी (हस्तलिखित क्र. ३९६) हस्तलिखितात महायोगी, सिध्दीयोगी, प्रेताक्षी, डाकिनी आणि इतर योगिनींच्या नावाबरोबर गणेश्वरी हे नाव आलेले आहे. तांत्रिक योगिनींची नावे जैन धर्मात कशी आली हे कळायला काहीच मार्ग नाही आहे.
बौध्दधर्माच्या वज्रयान पंथातसुध्दा वैनायकीचे गणपतीहृदया नावाने वर्णन आले आहे. धर्मकोशसंग्रह ग्रंथात गणपतीहृदया या देवीचे वर्णन एकमुख, द्विभुज, एक हात वरद आणि दुसरा हात अभयमुद्रेत आणि नृत्यस्थिती असे करण्यात आले आहे.
मथुरा येथील शासकीय संग्रहालयात असलेली वैनायकीची मूर्ती भारतातील सगळ्यात जुनी मूर्ती असावी. ह्या मूर्तीचा काळ गुप्त राजवंशाच्या सुरुवाताचा आहे असे मानले जाते. लोहरी (उत्तरप्रदेश) येथील योगिनी संकुलातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. प्रतिहार काळातील (९वे शतक) ही मूर्ती असून ह्या मूर्तीच्या डाव्या हातात इंद्रासारखे वज्र आहे. तर उजव्या हातात लाडूऐवजी एखादे फळ धरले आहे. ह्या वैनायकीचे वाहनसुध्दा हत्ती आहे. त्यामुळे हि मूर्ती वैनायकीची असली तरी त्यात इंद्राणी (इंद्राची शक्ती) हिचे गुणधर्म दाखवले आहेत. रीखीआन (उत्तरप्रदेश) येथील वैनायकीला चार हात असून डोक्यावर मुकुट घातलेला आहे आणि गळ्यात हार घातलेला आहे. ह्या मूर्तीला नेसवलेली साडी कंबरेभोवती खोचण्यात आलेली आहे. मध्यप्रदेशातील सुहानिआ येथे सापडलेली मूर्ती ग्वाल्हेर येथील पुरातत्व संग्रहालयात ठेवलेली आहे. वैनायकी त्रिभंग मुद्रेमध्ये असून आपले संपूर्ण वजन डाव्या पायावर घेतले आहे. ह्या मूर्तीच्या हातात कमळपुष्प, तलवार, परशू आणि लाडूंचा वाडगा हातात धरला आहे. ह्या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ बासरीवादक आणि डाव्या पायाजवळ मृदुंगवादक आहे.
वैनायकी (प्रतिहारकाळ, ९वे शतक), लोहरी, उत्तरप्रदेश वैनायकी (१०वे शतक), सुहानिया, मध्यप्रदेश. पुरातत्व संग्रहालय, भोपाळ वैनायकी (४थे शतक, गुप्तकाळ), मथुरा, उत्तरप्रदेश. शासकीय संग्रहालय, मथुरा
वैनायकीबद्दल लिहित असताना श्रीनटराज मंदिर (चिदंबरम, तामिळनाडू) येथील वैनायकीचा उल्लेख टाळून चालणार नाही. मूर्तिशास्त्रानुसार या मंदिरातील वैनायकी वेगळीच आहे. ह्या मूर्तीचा कंबरेच्या वरील भाग वैनायकीचा, तर कंबरेच्या खालील भाग व्याल या काल्पनिक प्राण्याचा आहे. भारतीय कलेत गजव्याल, शुकव्याल, सिंहव्याल, सर्पव्याल, शार्दुलव्याल इ. अनेक प्रकारचे व्याल बघायला मिळतात. परंतु वैनायकी आणि व्याल यांचे संयुक्त शिल्प दुर्मिळच म्हणावे लागेल. विजयनगर काळातील म्हणजे १६ व्या शतकातील ह्या शिल्पाची आजही स्थानिक लोकांकडून पूजा केली जाते.
वैनायकी आणि व्याल संयुक्त शिल्प (१६वे शतक, विजयनगरकाळ), श्रीनटराज मंदिर, चिदंबरम, तामिळनाडू
वैनायकीची चित्र लघुचित्र (Miniature Paintings) आणि हस्तलिखितांमध्ये सुध्दा बघायला मिळतात. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्र आहे. ह्या चित्रात नटेश तांडव नृत्य करत असून त्याच्या शेजारी विनायक, कार्तिकेय आणि गण दाखवले आहेत. ह्या चित्रात विनायक वीणा वाजवत असून नटेशाच्या डाव्या बाजूला गजमुख, चोळीधारण केलेली, दोन मृदुंग वाजवणारी आणि कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेली वैनायकी चित्रित केलेली आहे. कोलकातास्थित एशिआटीक सोसायटीत गणपतीहृदया देवतेचे अत्यंत सुंदर लघुचित्र आहे. हे लघुचित्र वज्रयान पंथाच्या धारणी-संग्रह ह्या ग्रंथात आहे. चित्रात देवता पांढऱ्या रंगात रंगवलेली असून पायाजवळ निळ्या रंगात उंदीर आहे. ह्या चित्राजवळ नेवारी संवत ९६३ (सन १८४३) आणि सर्वात शेवटी “आर्य्यश्रीगणपतिहृदयनामधारणी समाप्त” लिहिले आहे.
राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्रात डाव्या कोपऱ्यात वाद्य वाजवणारी वैनायकी गणपतीहृदया (सन १८४३), नेपाळ. एशियाटिक सोसायटी, कोलकाता
वैनायकीची ओळख करून घेतल्यानंतर महाराष्ट्रातील वैनायकी मुर्त्यांची ओळख करून घेऊया. महाराष्ट्रात १७-१८व्या शतकात घडवलेली पितळेची मूर्ती लखनऊ येथील राज्य संग्रहालयात आहे. त्याशिवाय यादवकालीन असलेल्या भुलेश्वर (पुणे), पाटेश्वर (सातारा) आणि आंबेजोगाई येथे वैनायकी दिसतात. या तीन ठिकाणांव्यतिरिक्त महाराष्ट्रात अजून तरी वैनायकी बघायला मिळालेल्या नाही आहेत.
पाटेश्वर मंदिरात असलेली वैनायकी
साताऱ्यापासून साधारणपणे ११ किमीवर देगाव येथे पाटेश्वर हा हिंदूलेणी समूह आहे. येथील पाटेश्वर मंदिरात वैनायकी मूर्ती आहे. मूर्ती रेखीव, चतुर्भुज आणि शिलाखंडावर सुखासनात बसलेली आहे. मागील उजव्या हातात परशु आणि डाव्या हातात पाश आहे कि अजून दुसरे काही आहे हे निश्चित करता येत नाही आहे. पुढील उजव्या हातात दात असून डाव्या हातात लाडूपात्र आहे. सोंडेचे टोक वळसा घालून लाडूंना टेकलेले आहे. मूर्तीच्या अंगावर वक्षभूषण, कंठभूषण, कमरपट्टा, कंकणे आणि वळे हे अलंकार असून, त्यांच्यावर विशेष अशी कलाकुसूर नाही आहे. डोक्यावर किरीटमुकुट असून, मुकुटाभोवतीप्रभावळ आहे. डाव्या पायाची आडवी मांडी घातलेली असून उजवा पायाचा गुडघा किंचित वर उचललेला असून पाय खाली टेकलेला आहे. पायाजवळ मूषक वाहन कोरलेले आहे.
पाटेश्वर मंदिरातील वैनायकी
भुलेश्वर मंदिरातील वैनायकी
पुणे – सोलापूर महामार्गावर यवतच्या आधी साधारणपणे १-२ किमीवर भुलेश्वरफाटा आहे. हा रस्ता थेट भुलेश्वर मंदिराजवळ जातो. दूरसंचार विभागाचा मनोरा हि भुलेश्वरची ओळख. हा संपूर्ण परिसर दौलतमंगळ किल्ला किंवा भुलेश्वर मंदिर या नावाने ओळखला जातो. भुलेश्वर मंदिरात प्रदक्षिणामार्गावर थोड्या उंचावर दोन वैनायकी मूर्ती दिसतात. परंतु येथील वैनायकी इतर देवतांच्या शक्तीबरोबर (मातृका) आढळून येतात. हे दोन्ही मातृकापट असावेत. पहिल्या मातृकापटात वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही या तीन मातृका आहेत. या शिल्पपटात वैनायकी माहेश्वरीच्या उजव्या हाताला तर ब्राम्ही डाव्या हाताला आहे. येथील वैनायकी पद्मासनात बसलेली आणि सालंकृत आहे. दुसरी वैनायकी वैष्णवी आणि कौमारी या मातृकांबरोबर आहे. पहिल्या वैनायकीप्रमाणेच हि वैनायकीसुध्दा सालंकृत आणि पद्मासनात बसलेली आहे.
वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही वैनायकी
वैनायकी, वैष्णवी आणि कौमारी वैनायकी
वैनायकीबद्दल चालेलेला गोंधळ मत्स्यपुराणातील अंधकासुरवधाची कथा वाचल्यानंतर अजूनच वाढतो आणि प्रश्न पडतो वैनायकीला योगिनी म्हणायचे की शक्ती की मातृका? कारण मत्स्यपुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करताना, त्याचे रक्त जमिनीवर पडल्यानंतर नवीन अंधकासुराची निर्मिती होऊ नये म्हणून युद्धात त्याच्या पडलेल्या प्रत्येक रक्ताचा थेंब भक्षण करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यापैकीच वैनायकी हि एक मातृका.
वैनायकी आणि इतर मातृकांची निर्मिती शंकराने केली, म्हणून ती गणेशाची माता असे काही मानल्यामुळे, अनेकदा सप्तमातृकापटांमध्ये गणपती दाखवलेला असतो. वेरूळ लेण्यातील सप्तमातृकापटामध्ये गणपती कोपऱ्यात असून शेजारी सर्व मातृका दाखवल्या आहेत. याच शिल्पात भैरवसुद्धा दाखवलेला आहे. मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांमध्ये गणपती सप्तमातृकांसोबत नसून, त्यांच्या समोर असलेल्या उपलेण्यात आहे. येथील सप्तमातृका काळाच्या ओघात नष्ट झाल्या असल्या तरी, त्यांच्या खुणांवरून त्यांचे अस्तित्व ओळखता येते. परंतु, पाटेश्वर येथे असलेल्या मातृकापटात गणेश किंवा गणेशानी यांना स्थान देण्यात आलेले नाही हे महत्वाचे.
सप्तमातृका, वेरूळ लेणे
वैनायकीची वरील सर्व माहिती वाचल्यानंतर एक गोष्ट समजते ती म्हणजे हिंदू आणि जैन ग्रंथात चौसष्ट योगिनीमध्ये असलेला तिचा समावेश. वैनायकीची पूजा कधी योगिनी, कधी शक्ती (स्वतंत्र देवता), तर कधी मातृका म्हणून मध्ययुगात होत होती.
वैनायकी कधी योगिनी, कधी शक्ती, तर कधी मातृका अश्या वेगवेगळ्या स्वरूपात पुढे आल्यामुळे वैनायकीबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढत जाते. तसेच वैनायकीबद्दल मूर्तिशास्त्रामध्येसुध्दा जास्त माहिती मिळत नसल्यामुळे वैनायकी भोवती एक वेगळेच गूढवलय निर्माण झाले आहे. वैनायकीचे कोडे सोडवायचे असेल तर तिच्याबद्दल अजून संशोधन होणे गरजेचे आहे आणि ह्या संशोधनातूनच वैनायकीची नवीन माहिती आपल्यासमोर येईल.
संदर्भ
गणेशा – द एन्चॅन्टर ऑफ थ्री वर्ल्ड्स, लेखक – पॉल मार्टिन दुबोस, अनुवाद – डॉ. किरीट मनकोडी
Iconography of Vainayaki, Author – B. N. Sharma




सप्तमातृका
पंकज समेळ,
प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.
भुलेश्वर मंदिरातील मातृका ( फोटो )
सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे. मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ. धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.
वेरूळ लेण्यातील सप्तमातृका ( फोटो )
सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या १६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री, महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही, योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध पुराणांमध्ये वाचायला मिळतात.
पाटेश्वर लेण्यातील अष्टमातृकापट ( फोटो )
भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत. कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन ४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या गोष्टीची साक्ष देतात.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील सप्तमातृका शिल्प ( फोटो )
सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे, त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते. काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो. सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा, वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात.
शिवाशी निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन अनेकदा बघावयास मिळते.
राजा दिनकर केळकर संग्रहालयातील सप्तमातृकापट
मातृकांचे वर्णन
ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस
वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: गरुड
इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती
माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल
कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर
वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि ध्वजचिन्ह: महिष
चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव
वैनायकी, पाटेश्वर लेणी
वैनायकी, भुलेश्वर मंदिर
वैनायकी, भुलेश्वर मंदिर
वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.
घारापुरी लेण्यातील सप्तमातृका
महाराष्ट्रातील काही सप्तमातृका शिल्प
घारापुरी लेणी
वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
भुलेश्वर मंदिर, यवत (वैनायकी मातृका)
पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका आणि मंदिरात वैनायकीची स्वतंत्र प्रतिमा)
धर्मापुरीचा किल्ला (अंबेजोगाईपासून साधारणपणे २५ किमी)
औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
टाकळी ढोकेश्वरची लेणी
श्री योगेश्वरी मंदिर, अंबाजोगाई (कळशावर असलेली वैनायकी)
संदर्भ
भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
Iconography of the Saptamatrikas, O. P. Misra
Elements of Hindu Iconography, T. A. Gopinatha Rao


ब्रह्मदेव – वारसा ठाण्याचा
पंकज समेळ,
हिंदूधर्मातील त्रिदेवांपैकी एक देव ब्रह्मा. ब्रह्माच्या उत्त्पतीच्या अनेक कथा आहेत. एका कथेनुसार अनैसर्गिक बीज आणि विष्णुरूप योनी यांच्या संयोगाने एक सोन्याचे अंडे प्रगट झाले आणि त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. कूर्मपुराणानुसार विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळातून ब्रह्मा प्रकट झाला. कूर्मपुराणातील दुसऱ्या कथेनुसार जल आणि आकाश तत्वापासून वराहरुपात ब्रह्मा प्रगट झाला. नंतर त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतींनी सृष्टी निर्माण केली. म्हणून ब्रह्मदेवाला ‘पितामह’ या नावाने ओळखले जाते. धाता, प्रजापती, विधाता इ. त्याची इतर नावे आहेत. कूर्मपुराणात ब्रह्माची परामूर्ती प्रजापती, हिरण्यगर्भ, वेदार्थवेदी भगवान आणि रजोगुणमय अशी चाररूपे सांगितली आहेत.
ब्रह्मदेव हे रजोगुणांचे प्रतिक आहे. निर्मिती करणे हे मुख्य कार्य असल्यामुळे ब्रह्माने युध्द केल्याच्या, कोणाचा संहार केल्याच्या कथा ऐकायला मिळत नाहीत. देव आणि असुर या दोघांनाही ब्रह्मा वंदनीय होता. असुरांनी ब्रह्मदेवाची खडतर तपश्चर्या करून उत्तमोत्तम वर मिळवल्याच्या कथा पुराणात वाचायला मिळतात आणि यामुळेच ब्रह्मदेवाने असुरांना वर द्यायचे, वरामुळे असुर उन्मत्त होऊन सर्वत्र हाहाकार माजवायचे व नंतर मग त्या असुरांना रोखण्यासाठी वरातून पळवाट काढून विष्णु व शंकर असुराचा नाश करणार असा क्रम असलेल्या अनेक पुराणकथा वाचायला मिळतात. त्याचबरोबर त्रिपुरासुराबरोबरच्या युध्दात ब्रह्माने शंकराच्या रथाचे सारथ्य केले, तसेच शिव-पार्वती यांच्या विवाहात त्याने पुरोहिताची भूमिका पार पाडली होती.
विष्णु आणि शंकर यांच्या जोडीने ब्रह्माची पूजा होत होती. परंतु ब्रह्मदेवाची स्तुती करणारा विशिष्ट संप्रदाय नसणे, असुरास प्रोत्साहन, असत्य कथन, सावित्रीचा शाप, कन्यासक्ती इ. कारणांमुळे मध्यकाळापर्यंत ब्रम्हपूजा अस्तंगत झाली. ललितविस्तार आणि दिव्यावदान या बौध्द ग्रंथात ब्रह्मदेवाचा उपास्य देवता म्हणून उल्लेख आलेला आहे.
ब्रह्मदेवाला पूर्वी पाच डोकी होती. पण ब्रह्माने शिवाचा विरोध केल्यामुळे भैरवाने त्यांचे डोके तोडले. पुढे ब्रह्मदेवाने शिवाचे स्तवन करून शिवास प्रसन्न करू घेतले. ब्रह्महत्येचे प्रायश्चित म्हणून भैरव ते कपाल घेऊन भिक्षा मागण्याकरिता निघून गेला. रुपमण्डण ग्रंथानुसार चार वेद, चार युगे आणि चार वर्ण यांचे प्रतिक म्हणजे ब्रह्माची चार मस्तके.
मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माला चार हात असतात. वाहन हंस असून तो कमळावर बसलेला असतो किंवा उभा असतो. हातात पुस्तक, माळा, कमंडलू, यज्ञपात्रे, वरदअभय मुद्रा असतात. ब्रह्मा संहारकर्ता नसल्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. शरीर थोडे स्थूल असून पोट थोडे सुटलेले असते.
भारतात ब्रह्माची मंदिरे फार कमी आहेत. त्यापैकी पुष्कर (राजस्थान) आणि खेडब्रह्म (गुजरात) ही मुख्य ठिकाणे मानायला हरकत नाही.
ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आणि ठाण्याचा वारसा असलेली ब्रह्मदेवाची मूर्ती काही वर्षांपूर्वी सिध्देश्वर तलावातील गाळ काढताना मिळाली. मूर्तीचा निश्चित काळ सांगता येत नसला तरी मूर्ती साधारणपणे ८००-१००० वर्ष जुनी आहे. या संपूर्ण परिसरावर इ.स. ८०० ते १२५० अशी साधारणपणे ४५० वर्षे शिलाहार राजघराण्याची राजवट होती. एवढी सुंदर मूर्ती कोणत्याही राजाश्रयाशिवाय निर्माण करणे शक्यच नाही. त्यामुळे ही मूर्ती शिलाहारकालीन आहे असे गृहीत धरायला हरकत नाही. शिलाहार राजघराण्याची पहिली राजधानी पुरी आणि दुसरी राजधानी श्रीस्थानक म्हणजे सध्याचे ठाणे.
उत्तरकोकण वर राज्य करणारे शिलाहार राजे राष्ट्रकूट राजघराण्याचे मांडलिक होते. कान्हेरी लेण्यात उत्तर शिलाहारांचा पहिला ज्ञात शिलालेख आहे. शके ७८५ मधील या लेखात पुल्लशक्तीने महासामंत हे बिरूद लावलेले आहे. तसेच आपले वडील कपर्दिन यांना महासामंत आणि कोकणवल्लभ ही बिरुदे राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष याच्यामुळे प्राप्त झाली असे सांगतो.
शिलाहार राजघराण्याने ठाणे आणि परिसरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. ठाण्यातील तलावपाळीजवळील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शके ९८२ मधील सुप्रसिद्ध शिवमंदिर, लोणाड येथील शिवमंदिर इ. मंदिरांचे बांधकाम शिलाहारकालात झाले हे निश्चितपणे सांगता येते. तसेच शिलाहारांच्या शिलालेखातूनसुध्दा अनेक मंदिराचे उल्लेख वाचायला मिळतात (उदा. व्योमेश्वर, षोंपेश्वर). त्याचबरोबर आटगाव येथील भग्नशिवमंदिर पण शिलाहारकालातील असावे असे त्याच्या स्थापत्यशैलीवरून वाटते.
सिध्देश्वर राममंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती सुमारे ५ फुट उंच, समभंग अवस्थेत आणि कमळावर उभी आहे. समभंग म्हणजे दोन्ही पायावर सरळ उभी असणारी आणि शरीराला कोठेही बाक नसणारी मूर्ती. मूर्तिशास्त्रात मूर्तीच्या उभे राहण्याच्या स्थितीवरून समभंग, अभंग, त्रिभंग आणि अतिभंग असे चार प्रकार असतात.
मूर्तीचे चारी हात भंगले असल्यामुळे कोणत्या हातात काय धारण केले असावे हे सांगता येत नाही.मूर्तिशास्त्राप्रमाणे हातात अक्षमाला, वेद, कमंडलू व यज्ञपात्रे किंवा वेद, यज्ञपात्रे व दोन हात वरदअभय मुद्रावस्थेत असावेत. मूर्तीला चार डोकी असून तीन दर्शनी भागात, तर चौथे डोके मागच्या बाजूला आहे. सर्व तोंडास दाढी आणि मिशी दाखवली आहे. डोक्यावर कोरीवकाम केलेला जटामुकुट आहे. कानात कुंडले, यज्ञोपवीत आणि कटीसूत्र धारण केले आहे. अंगावर वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मूर्तीला कोरलेल्या भुवया नाजूक आणि एकमेकांना जोडलेल्या आहेत. मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माचे शरीर स्थूल आणि पोटथोडे सुटलेले असते. पण शिल्पकारांनी मूर्ती तयार करताना ह्या गोष्टीला छेद दिलाआहे.
मुर्तीच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दाखवल्या असून त्या बहुदा सावित्री व गायत्री किंवा गायत्री व सरस्वती असाव्यात. दोन्ही बाजूंना हंस हे वाहन कोरले आहे. मूर्तीच्या मागे कलाकुसरयुक्त सुंदर प्रभावळ असून तिच्यावर किर्तीमुखे कोरलेली आहेत.
सिध्देश्वर तलाव परिसरात ब्रह्मदेवाचे मंदिर असावे. या मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात मंदिर नष्ट झाले आणि नंतर मुर्तीभंजंकापासून मूर्ती वाचवण्यासाठी मंदिराजवळ असलेल्या तलावात (आताच्या सिध्देश्वर तलावात) लपवून ठेवली असावी. परंतु ही मूर्ती कोणत्या राजवटीच्या काळात तलावात लपवून ठेवली आणि महाराष्ट्रात ब्रह्मदेवाची पूजा कधी बंद झाली हे निश्चितपणे सांगता येत नाही . नालासोपारा येथील चक्रेश्वर मंदिरात असलेल्या ब्रह्मदेवाच्या मूर्तीची स्थानिकांकडून अजूनही नित्य पूजा केली जाते ही उल्लेखनीय गोष्ट आहे.
ब्रह्मदेवाच्या मूर्तीच्या समोर असलेल्या राममंदिराच्या मागे ३-४ मूर्तींचे अवशेष पडलेले आहेत. पण त्या मूर्ती कोणाच्या आहेत हे काही कळून येत नाही. एका मूर्तीच्या गळ्यात कोरलेला हार अप्रतिम आहे. दुसऱ्या एका मूर्तीच्या आजूबाजूला जैन तीर्थंकरसदृश्य मुर्त्या कोरलेल्या आहेत. दुर्दैवाने ती मूर्ती कोणाची आहे हे समजून येत नाही.
सद्यस्थितीत ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या मूर्तीला संवर्धनाची गरज आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे खंडित झालेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही. परंतु अजूनही काही भाविक ह्या मूर्तीची पूजा करतात. या मूर्तीला शेंदूर, फुले, हळदकुंकू इ. घटकांमुळे हानी पोचत आहे. त्यामुळे मूर्तीला आणि इतर अवशेषांना संग्रहालयात हलवणे ही काळाची गरज आहे किंवा सध्याच्या जागी त्यांचे योग्य संवर्धन करणे.
संदर्भ
भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी
Elements of Hindu Iconography, T. A. Gopinatha Rao
 
 
 

वैनायकी – गणपतीची शक्ती

विनायक परब

१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत गणपतीसारखीच सोंड असलेली, मात्र स्त्रीरूप असलेली वैनायकी किंवा विनायकीची मूर्ती वा तिच्या प्रतिमा सापडल्या आहेत. मात्र ती नेमकी कोण, पत्नी, शक्ती की मातृका, हा प्रश्न कायम आहे. पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ शोध घेत असलेल्या या वैनायकीचे गूढ उकलले तर विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल.

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यामध्ये असलेल्या ‘आर्किऑलॉजिकल सव्‍‌र्हे

ऑफ इंडिया’च्या एका गोडाउनमध्ये १९०९ साली प्रतिहार शैलीतील एक मूर्ती सापडली, ही मूर्ती गजाननाची आहे, असे सुरुवातीस वाटले, मात्र नंतर व्यवस्थित पाहिले असता ती मूर्ती सोंड असलेल्या स्त्रीरूपाची आहे, असे संशोधकांच्या लक्षात आले. त्या मूर्तीचा कालखंड शैलीनुसार निश्चित करताना लक्षात आले की, ती १० व्या शतकातील आहे. गणपतीसारखीच सोंडधारी पण स्त्रीरूपिणी म्हणून सुरुवातीस तिचे नामकरण विनायकी किंवा वैनायकी असे करण्यात आले. दरम्यानच्या काळात या वैनायकीचा उल्लेख कुठे प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सापडतोय का, याचीही चाचपणी पुरातत्त्वतज्ज्ञांनी आणि प्राच्यविद्या संशोधकांनी केली. त्या वेळेस तिचे संदर्भही एक एक करत सापडत गेले. काही पुराणांमध्ये तिचा उल्लेख सापडला तो वैनायकी म्हणून. काही कथांमध्येही तिचा संदर्भ सापडला. तेव्हापासून ते आजपर्यंत पुरातत्त्वतज्ज्ञ आणि प्राच्यविद्यातज्ज्ञ या वैनायकीचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात अद्यापही पूर्ण यश आलेले नाही.

णपतीसारखीच सोंड असलेली मात्र स्त्रीरूप असलेली ही वैनायकी किंवा

विनायकी या दोन नावांशिवाय स्त्रीगणेश, गजानन (गजमुख असलेली), विघ्नेश्वरी म्हणूनही शास्त्र-पुराणांमध्ये ती ओळखली जाते. ती नेमकी कोण, हा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. काहींच्या मते ती गणेशाची सहचारिणी आहे, काहींच्या मते ती त्याची शक्ती आहे तर काहींच्या मते ती ६४ किंवा ८४ योगिनींपैकी एक आहे, तर काहींच्या मते ती मातृकांपैकी एक असून गणेशाचे आणि तिचे नातेसंबंध हे आई व मुलाचे आहेत. ही एवढी म्हणजेच आई-मुलापासून ते अगदी त्याची शक्ती किंवा सहचारिणी असण्यापर्यंतची त्यांची नाती व्यक्त होण्याची कारणे ही वैनायकीच्या आजवरच्या झालेल्या किंवा करण्यात आलेल्या चित्रणामध्ये दडली आहेत. हे चित्रण कधी तिच्याशी संबंधित कथांमध्ये येते, कधी चित्रांमध्ये पाहायला मिळते तर कधी लेण्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये शिल्पित झालेले दिसते. या साऱ्याचा हा अभ्यासात्मक आढावा!

१९०९ सालच्या त्या घटनेनंतरची सर्वात महत्त्वाची घटना होती ती १९३१ सालची. आर. डी. बॅनर्जी यांनी त्यांच्या ‘हैहयाज् ऑफ त्रिपुरी अ‍ॅण्ड देअर मॉन्युमेंट्स’ या त्यांच्या पुस्तकामध्ये आणखी एका अशाच सोंडधारी स्त्रीप्रतिमेची म्हणजेच वैनायकीची नोंद केली. हे शिल्प मध्य प्रदेशातील बेडाघाट येथे पाहायला मिळते. त्यानंतर अनेक संशोधकांनी त्यांच्या त्यांच्या परीने घेतलेल्या शोधामध्ये देशभरातील वैनायकींची नोंद होऊ लागली. मग लक्षात आले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत (या दोन्ही ठिकाणी वैनायकी सापडली आहे.) वैनायकीचे अस्तित्व आहे. महाराष्ट्रामध्येदेखील तीन वैनायकी सापडल्या आहेत, त्यातील एक प्रतिमा सध्या राज्यात नाही तर इतर दोन प्रतिमा या मंदिरातील शिल्पांमध्ये कोरलेल्या आहेत. किंबहुना यातील एका शिल्पकृतीमुळे या संदर्भातील संशोधनाला वेगळा आयाम मिळाला आहे.

आजवर भारतीयांनी गणपतीकडे पाहिले ते दैवत म्हणून. त्यामुळेच त्याला

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले. मात्र गणपती या देवतेचा पुरातत्त्वीय अंगाने शास्त्रीय शोध घेण्याची गरज होती. ही गरज पूर्ण केली ती पॉल मार्टिन दुबोस यांनी. जन्माने फ्रेंच असलेले पॉल भारतीय शिल्पशास्त्र आणि वास्तुरचना यांनी प्रभावित होऊन भारतात आले. त्यावर त्यांनी संशोधनही केले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, भारतीयांनीदेखील आजवर गणपतीवर सर्वसमावेशक असे संशोधन केलेले नाही. मग त्यांनीच ते संशोधन करण्याचा ध्यास घेतला. स्वत: संन्यस्त आयुष्य जगत त्यांनी हे संशोधन काम पूर्णही केले. याच संशोधनादरम्यान त्यांना वैनायकीही लक्षात आली. तिचाही शोध त्यांनी सर्वत्र भारतभर फिरून घेतला आणि मग गणपतीवर त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांनी एक प्रकरण वैनायकीवरच बेतले. त्यांचा हा संशोधन प्रबंध फ्रँको इंडियाच्या प्रोजेक्ट फॉर इंडियन कल्चरल स्टडीजअंतर्गत फ्रँको इंडियानेच ‘गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वल्र्ड्स’ या नावाने प्रकाशित केला. फ्रेंचमध्ये प्रकाशित झालेला हा मूळ शोधप्रबंध इंग्रजीमध्ये आणण्याचे काम प्रसिद्ध पुरातत्त्वतज्ज्ञ डॉ. किरीट मनकोडी यांनी केले.

पॉल मार्टिन दुबोस यांनी या संशोधनामध्ये भाविकाचा दृष्टिकोन यशस्वीपणे

टाळला. त्यामुळे या संशोधनाला शास्त्रीय मूल्य प्राप्त झाले आहे. त्यासाठी ते संस्कृत शिकले, गणेश साहित्य, गणेश प्रतिमा-प्रतीके यांचा सखोल अभ्यास केला. गणेशाचे प्रतिमाशास्त्र, त्यात वेळोवेळी झालेले बदल, भारतीय शिल्पशास्त्राच्या पद्धती-परंपरा आणि गणेशाशी संबंधित सर्व कथा-दंतकथा-रूपके यांचाही अभ्यास केला. त्याच्या शास्त्रीय परिष्करणातून हे संशोधन पुढे आले. वैनायकीचा शोध घेताना पॉल यांना लक्षात आले की, तिच्या इतर प्रचलित नावांबरोबर गणेश्वरी, गणेशनी आणि लम्बोदरी अशीही तिची आणखी तीन नावे आहेत. या साऱ्याचे संदर्भ सापडतात. शिवाय उत्तर भारत आणि मध्य भारतात त्याचप्रमाणे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, ओरिसा आणि आसाम या ठिकाणी ती मोठय़ा प्रमाणावर सापडते, पाहायला मिळते.

दक्षिण भारतात राजेंद्र चोला या राजाच्या कालखंडात (११ वे शतक) कोरण्यात

आलेल्या शिलालेखांमध्येही तिचा उल्लेख पॉलना आढळला. बंगळुरूजवळ असलेल्या कोलार येथे ‘गणेशनी’ असा तिचा उल्लेख असून ६४ योगिनी आणि मातृकांमध्ये तिचा उल्लेख येतो. तसेच मदुराई आणि सुचिंद्रमच्या मंदिरांमध्ये असलेल्या स्तंभांवरही तिची प्रतिमा शिल्पित झालेली दिसते.

उत्तर कर्नाटकातील शिराळी येथील संग्रहालयामध्ये दोन वैनायकी प्रतिमा

संग्रहामध्ये आहेत, त्यातील एक लखनौ येथील तर दुसरी महाराष्ट्रात सापडलेली वैनायकीची ब्राँझमधील प्रतिमा समाविष्ट आहे. (महाराष्ट्रातील प्रतिमा १६ व्या शतकातील आहे) म्युनिच म्युझियममध्ये ही वैनायकीची प्रतिमा असून ती भारतातील केरळमध्ये सापडलेली होती. ही प्रतिमाही १६ व्या शतकातीलच आहे. जशी ही प्रतिमा शिल्पकृतींमध्ये दिसते तशीच ती लघुचित्रांमध्ये किंवा इतर चित्रांमध्येही पाहायला मिळते.

प्राचीन भारतीय साहित्यांमध्येही वैनायकीचा संदर्भ येतो. लिंगपुराण,

स्कंदपुराणातील काशीस्कंदामध्ये त्याचप्रमाणे गोरक्षसंहितेमध्येही गजानन किंवा वैनायकीचा संदर्भ येतो. विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये तिचा उल्लेख मातृका म्हणून येतो. अंधकासुराच्या वधाच्या वेळेस त्याचे रक्त पडल्यानंतर प्रत्येक थेंबातून होणाऱ्या अंधकासुराच्या नव्या निर्मितीच्या वेळेस युद्धात त्याचा पडलेला प्रत्येक थेंब खाली न पडू देता तो भक्षण करण्यासाठी शिव शंकरांनी मातृकांची निर्मिती केली, त्यात वैनायकी होती असा संदर्भ येतो. मत्स्यपुराणामध्येही हीच कथा देण्यात आली असून त्यात शंकराने निर्मिती केलेल्या २०० देवतांमध्ये ती होती, असे म्हटले आहे. याचा अर्थ तिचा संबंध मातृका असण्याशी आहे. शिव शंकरांची शक्तीरूपिणी म्हणून ती गणपतीची आई असा संदर्भ काही संशोधकांनी लावला आहे. म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला गणपतीच्या शिल्पकृतींसमोर सप्तमातृका पाहायला मिळतात. महाराष्ट्रात औरंगाबाद लेण्यांमध्ये गणपतीच्या एका बाजूस मातृका तर दुसऱ्या बाजूस बुद्ध शिल्पित करण्यात आले आहेत. तर मुंबईतील जोगेश्वरी लेण्यांमध्येही गणपतीच्या शिल्पाच्या बरोबर समोरच्या बाजूस सप्तमातृका कोरलेल्या असून त्या शिल्पकृतीची बरीचशी झीज झाली आहे. मात्र त्या सप्तमातृका आहेत, हे पुरते लक्षात येते.

वैनायकीची शिल्पे ही बसलेली, उभी किंवा नृत्यावस्थेतील आहेत. तिला दोन किंवा चार हात दाखविलेले आहेत. दगडामध्ये कोरलेल्या अनेक प्रतिमांची झीज झालेली आहे किंवा मग त्या तुटलेल्या तरी आहेत त्यामुळे तिची अस्त्र-शस्त्रे यांची नेमकी माहिती हाती नाही. पण काही प्रतिमांमध्ये लक्षात आलेल्या अस्त्रांमध्ये परशू, वज्र, साप, तुटलेला हत्तीचा दात (एकदंताशी नाते सांगणारा), मोदकपात्र किंवा वीणा यांचा समावेश आहे. शिवाय अभय किंवा वरद म्हणजे रक्षण करणारी किंवा वर देणारी या मुद्राही तिच्या हातांमध्ये पाहायला मिळतात. या मुद्रांवरून तिचे देवत्व पुरते सिद्ध होते. रिखिआन (१० वे शतक), बेडाघाट (११ वे शतक), हिरपूर, झारिआल (ओरिसा- १० वे शतक) या सर्व ठिकाणी ती मातृका म्हणून किंवा ६४ योगिनींपैकी एक म्हणून येते. प्रसिद्ध अभ्यासक देवांगना देसाई यांनीही त्यांच्या संशोधन प्रबंधामध्ये तिचा उल्लेख योगिनी म्हणूनच केला आहे.

चिदम्बरम आणि मदुराईतील मूर्तीमध्ये ती व्याघ्रपाद म्हणजे वाघाचे पाय

असलेली अशी दाखविण्यात आली आहे. जे. ए. बॅनर्जी यांनी त्यांच्या शोधप्रबंधामध्ये तिचा उल्लेख गणेशाची स्त्रीरूपिणी किंवा रिद्धी, सिद्धी, बुद्धी, पुष्टी, भारती किंवा नीला सरस्वतीप्रमाणेच त्याची सहचारिणी म्हणून केला आहे. मात्र यातील एक महत्त्वाचा फरक इथे लक्षात घ्यायलाच हवा तो म्हणजे वैनायकी वगळता सर्व सहचारिणी या मानवी स्त्रीरूपातच शिल्पित किंवा चित्रित झाल्या आहेत. रिखिआन येथील वैनायकीचे ९ व्या शतकातील शिल्प हे सर्वात जुने शिल्प मानले जाते.

वैनायकी ही गणेशाची शक्तीरूपिणी स्त्री असण्याची शक्यता असल्याचे दोनच संदर्भ संपूर्ण भारतात सापडतात. त्यातील एक संदर्भ हा उदयपूरच्या उदयेश्वर मंदिराच्या गर्भगृहामध्ये आहे. तर दुसरा संदर्भ म्हणजेच शिल्प १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रातील औंढय़ा नागनाथ मंदिरावर आहे. या दोन्ही ठिकाणी गणपती वैनायकीसोबत पाहायला मिळतो. त्यातही औंढय़ा नागनाथचे शिल्प सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण हे जगातील एकमेव शिल्प आहे, ज्यात गणपती, सिद्धी, बुद्धी आणि वैनायकीच्या सोबत दिसतो.

मात्र देवतेची शक्ती म्हणजे त्याची पत्नी नाही हे समीकरणही इथे लक्षात घ्यावे लागते. शक्ती म्हणजे ऊर्जा. अगदी अश्मयुगापासून माणसाला स्त्रीमधील प्रसवण्याची शक्ती म्हणजे ऊर्जा असे वाटत आहे. ती शक्ती आहे, असे माणसाने मानले. म्हणूनच जगभरात सर्वत्र देवतेच्या सापडलेल्या पहिल्या प्रतिमा या लज्जागौरीच्या म्हणजेच मातृकेच्या पायविलग अवस्थेतील तिचे जननेंद्रिय स्पष्टपणे दाखविणाऱ्या अशा आहेत. किंबहुना म्हणून कोणत्याही देवतेची शक्ती किंवा ऊर्जा दाखविताना ती स्त्रीरूपातच दाखविली जाते. मात्र याचा अर्थ ती त्याची पत्नी असा होत नाही. किंबहुना म्हणूनच वैनायकीबाबतचे हे गूढ अद्याप उकललेले नाही. ती नेमकी कोण, पत्नी, ऊर्जा म्हणजेच शक्ती की मातृका हा प्रश्न अद्याप कायम आहे. हे गूढ उकलेले त्या वेळेस विनायक म्हणजेच गणपती आपल्याला नव्याने आकळेल असे संशोधकांना वाटते आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेशाशी संबंधित हे स्त्रीरूप समजून घेणे सयुक्तिक ठरावे.

संदर्भ – गणेशा-द एन्चॅन्टर ऑफ थ्री वर्ल्ड्स- पॉल मार्टिन दुबोस, अनुवाद- डॉ. किरीट मनकोडी आणि पुरातत्त्वतज्ज्ञ व प्रतिमाशास्त्रातील जाणकार डॉ. किरीट मनकोडी यांच्याशी वेळोवेळी झालेला संवाद.

विनायक परब – vinayak.parab@expressindia.com

 
 अष्टदिक्पाल


प्राचीन मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांवर, तसेच सभामंडपामध्ये, अंतराळात आपणास अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात - शिव, विष्णू, देवी आदी देवता, सुरसुंदरी, नर्तक, वादक ह्याशिवाय सर्वसाधारणपणे हटकून दिसतात त्या लोकपालांच्या अर्थात दिक्पालांच्या मूर्ती. हे दिक्पाल त्या त्या विशिष्ट दिशांचे आणि उपदिशांचे पालन करतात, असे मानले जाते. इंद्र, अग्नी, वायू, यम, कुबेर, वरुण, ईशान आणि निर्ऋती ह्या त्या दिशांच्या देवता. मुख्य दिशांच्या देवतांची नावे वेगळी, मात्र उपदिशा आणि त्यांच्या देवता यांची नावे एकमेकांना समांतर असलेलीच आढळून येतात. उदा. आग्नेयेचा दिक्पाल अग्नी, नैर्ऋत्येचा निर्ऋती, ईशान्येचा ईशान आणि वायव्येचा वायू. ही उपदिशांची नावे त्या त्या देवतेपासूनच पडलेली आहेत, हे उघड आहे. इंद्र, अग्नी, वायू, यम, वरुण आणि ईशान ह्या वैदिक देवता आहेत, कुबेर हा यक्षांचा अधिपती, तर निर्ऋती हा चक्क राक्षस आहे. अगदी क्वचित ह्या दिक्पालांच्या मूर्ती त्यांच्या शक्तीसहदेखील आढळतात. दिक्पाल मूर्ती ओळखणे तसे सोपे आहे. त्यांची वाहने आणि हातातील आयुधे यावरून ते सहज जाणून घेता येते. चला तर मग, आता एकेक दिक्पालाची विस्ताराने माहिती घेऊ.

इंद्र (पूर्व दिशेचा अधिपती)

हा देवतांचा राजा. ऐरावत हत्ती हे त्याचे वाहन. वेदांतील सर्वाधिक प्रसिद्ध देवता म्हणजे इंद्रच. इंद्राची पूजा पूर्वी इंद्रध्वजाच्या रूपाने जनमानसात प्रचलित असे. ह्या इंद्रध्वजाच्या पूजेचे वर्णन माझ्या 'गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन' ह्या लेखात विस्ताराने दिलेले आहे. इंद्राची पत्नी शची. काही ठिकाणी इंद्र शचीसह दिसतो. इंद्राची मूर्ती ओळखणे अगदी सोपे. हत्तीवर स्वार किंवा पायाशी हत्ती अशा पद्धतीने इंद्र दाखवला जातो. हातातील आयुधे म्हणजे वज्र, अंकुश.

कायगाव टोके मंदिरात असलेली इंंद्राची मूर्ती - हातात अंकुश, गदा, अक्षमाला आणि कमंडलू आहेत, तर वाहन हत्ती हे पायाशी आहे.

a

वेरुळ येथील धुमार लेणीत शिल्पपटात असलेली इंद्राची मूर्ती

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातली हत्तीवर स्वार इंद्राची मूर्ती, हाती वज्र आणि अंकुश आहेत.

a

पेडगाव येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील इंद्राची मूर्ती

a

अग्नी (आग्नेयेचा अधिपती)

वैदिक देवतांत इंद्रानंतर कोणाचे स्थान असेल तर ते अग्नीचे. यज्ञाच्या माध्यमातून देवांना हवी पोहोचवण्याचे काम करणारा तो अग्नी. अग्नीची मूर्ती ओळखायची सर्वात सोपी खूण म्हणजे त्याचे वाहन एडका. यज्ञात अजापुत्राला अर्थात बोकडाला यज्ञपशू म्हणून महत्त्वाचे स्थान असल्याने अग्नीचे ते वाहन असल्यास नवल नाही. अग्नीच्या इतर लक्षणांमध्ये त्याची आयुधे म्हणजे ध्वज, कमंडलू, अ़क्षमाला, शक्ती. आयुधात बर्‍याच वेळा पोथी, गदा, स्रुक, स्रुवा अशी भिन्नताही आढळते.

कायगाव टोके येथील अग्नीचे शिल्प

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरावरील बाह्य भिंतीवर असलेली एडक्यावर स्वार अग्नी मूर्ती

a

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्य भिंतीवरील अग्नी शिल्प

a

वेरुळच्या प्रवेशद्वारावर कोरलेली अग्नी मूर्ती

a

ह्याशिवाय पाटेश्वर येथील लेणीत अग्नीची एक वेगळीच प्रतिमा बघायला मिळते.
ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८व्या सूक्तातील तिसर्‍या श्लोकात अग्नीचे वर्णन पुढील प्रकारे आले आहे -

चत्वारि शर्ङगा तरयो अस्य पादा दवे शीर्षे सप्त हस्तासो अस्य |
तरिधा बद्धो वर्षभो रोरवीति महो देवो मर्त्यां आ विवेश ||

अग्नी हा ४ शिंगे, ३ पाय, २ मस्तके, ७ हस्त आणि ३ ठिकाणी बांधलेला एक वृषभच आहे.

चार शिंगे म्हणजे चार वेद, ३ पाय म्हणजे दक्षिण, गार्हपत्य आणि आहवनीय हे तीन प्रकारचे अग्नी, २ मस्तके म्हणजे एक मानवाचे (हवन करणार्‍या ऋषीचे) आणि दुसरे वृषभाचे (हे बांधलेल्या यज्ञपशूचे प्रतीक), ७ हस्त म्हणजे काली, कराली इत्यादी सात प्रकारच्या ज्वाला. असा हा अग्निवृष.

पाटेश्वर येथील अग्निवृष

a

अग्निवृष

a

वरुण (पश्चिम दिशेचा अधिपती)

वरुण ही जलदेवता. पश्चिमेकडील बाजूस समुद्र असल्याने साहजिकच हा पश्चिमेचा अधिपती झाला. पाश हे वरुणाचे प्रमुख आयुध आणि जलदेवता असल्याने मकर हे त्याचे वाहन झाले. जलदेवता असल्याने काही वेळा एका हातात तर काही वेळा दोन्ही हातात कमळे आढळतात. समुद्रच नव्हे, तर सरोवरे, नद्या जिथे जिथे जल असेल त्यांचा स्वामी वरुण बनला.

कायगाव टोके येथील वरुणाची मूर्ती

a

पेडगाव येथील वरुणाची मूर्ती, मकर हे वाहन पायापाशी दिसेल.

a

वेरुळ येथील कैलास लेणीतील वरुणाची मूर्ती

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील मकरारूढ वरुण

a

वायू (वायव्येचा अधिपती)

वैदिक ग्रंथांत वायूस महत्त्वाचे स्थान नाही, मात्र महाभारत, रामायण हा महाकाव्यांत अनुक्रमे भीम आणि हनुमान यांचा जनक म्हणून मानाचे स्थान आहे, तर वायूच्या आराधनेसाठी वायुपुराणही निर्मिले गेले. वायूच्या मूर्तीच्या निर्मितीत त्याच्या अंगभूत लक्षणांचा पुरेपूर वापर केला गेल्याचे आपणास दिसते. वायूच्या दोन्ही हातात फडफडत्या पताका/ध्वज दिसतात, वायूचे वस्त्रदेखील फडफडताना दिसते, वायुमूर्ती ओळखण्याचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याचे वाहन हरीण. वेगाने धावत असल्याने हरीण हेच वायूचे वाहन बनल्यास त्यात काहीच नवल नाही.

कायगाव टोके येथील दोन्ही हातांत फडफडत्या पताका, कमंडलू, अक्षमाला आणि वाहन हरीण यांनी युक्त अशी वायुमूर्ती

a

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील बाह्य भिंतीवरील वायुमूर्ती

a

वेरुळ लेण्यातील वायुमूर्ती

a

यम (दक्षिण दिशेचा अधिपती)

यम ही वैदिक देवता. सूर्याचा पुत्र. मृतांना स्वर्गास अथवा नरकास पोहोचवणारा हा देव. मृतांना नेण्यास हा आपल्या दूतांना पाठवतो. दक्षिण दिशा मृतांची मानली गेली आहे, साहजिकच यमाकडे दक्षिणेचे आधिपत्य आले किंवा यमाकडे दक्षिण दिशेचे आधिपत्य आहे, म्हणूनही दक्षिण दिशेस मृतांची दिशा मानले गेले असावे. ऋग्वेदातील १० मंडलातील यम-यमी संवाद हे संवादसूक्त अतिशय प्रसिद्ध आहे. तर महाभारतात पतिव्रतोपाख्यानात सत्यवान-सावित्री आणि यम यांची कथा विस्ताराने आली आहे. मार्कंडेयास नेण्यास आलेल्या यमाचे पारिपत्य करणार्‍या शिवाची कथा तर प्रसिद्धच आहे. कालारी शिव अर्थात मार्कंडेयानुग्रह मूर्तीत शिव आणि यमाचे शिल्पांकन केलेले आढळते. यम हा काळाचे/मृत्यूचे प्रतीक, साहजिकच त्याचे वाहन रेडा हेच आहे. इतर लक्षणांत पाश, दंड, खड्ग, अक्षमाला/कमंडलू ही आयुधे अंतर्भूत आहेत.

कायगाव टोके येथील यमाची प्रतिमा - हाती दंड, यमपाश, अक्षमाला आणि पापपुण्याची नोंदवही आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपातील यमाचे शिल्प

a

कैलास लेणे, वेरुळ येथील यमाचे शिल्प

a

कुबेर (उत्तर दिशेचा अधिपती)

कुबेर हा विश्रव्याचा पुत्र असल्याने याला वैश्रवण असेही म्हणतात. हा यक्षांचा अधिपती. साहजिकच यक्षांप्रमाणेच ह्याचे शरीरही स्थूल दाखवले जाते. 'कुसित बेरं शरीरं यस्य सः' - अर्थात ज्याचे शरीर कुरूप, बेढब असा तो कुबेर. अर्थात कुबेराच्या सर्वच मूर्ती स्थूल आहेत असेही नाही. त्याच्या मूर्ती सडपातळही आहेत. कुबेर हा जैन आणि बौद्धांमध्येही आढळतो. बौद्धांमध्ये तो जंभाल होतो. त्याची पत्नी भद्रा ही बौद्धांमध्ये हरिती होते.

कुबेराची मूर्ती ओळखणे तसे अवघड, कारण कुबेराची लक्षणे एकसारखी नाहीत. त्याचे प्रमुख वाहन नर. स्थूल असल्याने पालखीद्वारे हा उचलला जात असल्याने कुबेराला नरवाहन म्हणतात. काही वेळा कुबेराचे वाहन हत्ती किंवा घोडा हेसुद्धा दाखवल्याचे दिसते. मात्र कुबेर ओळखण्याचे एक हमखास लक्षण म्हणजे त्याच्या हाती असलेली धनाची पिशवी आणि मुंगूस. कुबेर हा देवांचा धनाध्यक्ष. साहजिकच त्याच्या हाती धनाची पिशवी असते, तर मुंगूस हेसुद्धा धनाचे प्रतीक. मुंगूस दिसल्यावर धनलाभ होतो असे आजही मानतात. मात्र मुंगूस हे कुबेराचे वाहन नव्हे.

कायगाव टोके येथील कुबेर प्रतिमा. येथे वाहन हे हत्ती असून हाती धनाची पिशवी घेतलेली आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील घोड्यावर बसलेल्या कुबेराची प्रतिमा

a

पेडगाव येथील मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर

a

वेरुळ येथील क्र. २०च्या लेणीतील तुंदिलतनू असलेला कुबेर

a

वेरुळ येथील बौद्ध लेणीतील जंभाल आणि हरितीची प्रतिमा

a

निर्ऋती (नैर्ऋत्येचा अधिपती)

निर्ऋतीचे नाव ऋग्वेदात आढळते, मात्र त्याबद्दल अधिक माहिती मिळत नाही. वेदात हा राक्षस म्हणूनच ह्याचा उल्लेख येतो. काही पुराणे निर्ऋतीला स्त्रीरूपी मानतात आणि अलक्ष्मी म्हणूनही निर्ऋतीचे नाव येते. वेदोक्त देवतांच्या रूपांमध्ये विविध कथापुराणांद्वारे हळूहळू बदल होत जाताना निर्ऋतीला दिशाधिपतीचे काम आले असावे, असे म्हणता येते. निर्ऋतीच्या मूर्तीही तुलनेने मोजक्याच आढळतात, ज्या मंदिरांमध्ये दिक्पाल मूर्ती आहेत, तिथेही काही वेळा निर्ऋतीची मूर्ती नसते. मात्र निर्ऋतीची मूर्ती जिथे असेल तिथे ती ओळखणे मात्र सोपे आहे. निर्ऋती हा प्रेतवाहन किंवा नरवाहन. हाती खड्ग, खेटक, नरमुंड ही सर्वसाधारण लक्षणे आणि चेहरा उग्र, दाढा विचकलेल्या असे रूप.

कायगाव टोके येथील निर्ऋतीची मूर्ती. हाती खड्ग, खेटक (ढाल), नरमुंड आणि एक हात अभयमुद्रेत आहे.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील नरवाहन निर्ऋतीची मूर्ती

a

खिद्रापूरच्याच कोपेश्वर मंदिरातील प्रेतवाहन निर्ऋतीची मूर्ती

a

ईशान (ईशान्येचा अधिपती)

ईशान हे शिवाचेच एक रूप आहे, त्यामुळे ह्याच्या मूर्तीची लक्षणे जवळपास सर्वच शिव आणि भैरवासारखीच आहेत. हाती डमरू, कमंडलू, त्रिशूळ, नाग. याचे वाहन बैल. भैरवमूर्ती आणि ईशान यांच्यामधील फरक म्हणजे भैरव रौद्र आणि काही वेळा नग्न असतो आणि भूतगण, नरमुंडही बाजूला असतो, तर ईशान मूर्ती सौम्य असते.

कायगाव टोके येथील ईशान मूर्ती

a

पेडगाव येथील ईशान मूर्ती

a

पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ईशान मूर्ती

a

मातृका

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा |
वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ||

ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, इंद्र आदी देवतांच्या अंशापासून मातृका उत्पन्न झाल्या, असे विविध पुराणांमध्ये उल्लेख आहेत, तर अंधकासुरवध कथेत शिवाने मारलेल्या अंधकासुराच्या रक्तापासून नवीन असुर उत्पन्न होऊ नयेत म्हणून त्यांचे रक्त पिण्यासाठी योगेश्वरी आणि इतर मातृका उत्पन्न केल्या, असा उल्लेख आहे. वर श्लोकात उल्लेख केल्याप्रमाणे ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा ह्या सप्तमातृकांसह कधीकधी आठवी मातृका नारसिंहीसुद्धा दिसते. मातृका ह्या शाक्त अथवा तंत्र पंथामधील समजल्या जातात. ह्या मातृकांचे शिल्पांकन सर्वसाधारणपणे वेगवेगळे आढळत नाही, त्या पट स्वरूपातच आपल्याला दिसतात. सप्तमातृकापटात नेहमी मातृकांच्या एका बाजूला वीरभद्र आणि दुसर्‍या बाजूला गणेश आढळतो. ह्या दोघांच्या मध्ये सात मातृका आपल्या बाळांसह दिसतात. तर प्रत्येक मातृकेच्या खालील बाजूस त्यांची वाहने कोरलेली असतात. क्वचित प्रसंगी मातृकांची वेगवेगळी शिल्पेदेखील दिसतात. चामुंडा मात्र जवळपास सर्वत्रच स्वतंत्र कोरलेली आढळते.

मातॄकांची वाहने पुढीलप्रमाणे

ब्राह्मी - हंस
माहेश्वरी - बैल
कौमारी - मोर
वैष्णवी - गरुड
वाराही- वराह, घुबड
इंद्राणी - हत्ती
चामुंडा- प्रेत

आता काही सप्तमातृकापट पाहू या.

वेरुळ येथील कैलास लेणीतील सप्तमातृकापट

कैलास लेणीतील यज्ञशाळेतील समोरील बाजूस कोरलेला आहे हा प्रचंड सप्तमातृकापट. या सप्तमातृकांची पूजा नेहमी यज्ञाच्या वेळी केली जायची. वाराही, ऐंद्री, वामनी (ब्राह्मणी), नारसिंही या वैदिक अंश असलेल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या अनार्य अंश असलेल्या सप्तमातृका. यातील प्रत्येक मातेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. ह्या देवता म्हणजे जननशक्तीचे जणू एक प्रतीकच. अतिशय देखण्या आणि सालंकृत असलेल्या ह्या मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. मूर्तिभंजकांनी मातृकांची मस्तके जरी नष्ट केली असली, तरी प्रत्येक मूर्तीच्या खाली तिचे वाहन कोरलेले आहे, त्यावरून ह्या मातृका सहज ओळखू येतात. येथील एक वाहनांतील बदल म्हणजे वाराहीचे वाहन महिष असून चामुंडेचे शृगाल आहे.

a

वेरुळ येथील लेणी क्रमांक १४ येथील सप्तमातृकापट (येथे चामुंडेचे वाहन घुबड हे आहे)

a

वेरुळ येथील कैलास लेणीच्या डावीकडील लहानशा लेणीतील उभ्या स्थितीत असलेल्या सप्तमातृकांचा पट

a

टाकळी ढोकेश्वर येथील सप्तमातृकापट

लेणीतील प्रवेशद्वारातून आत जाताच डावीकडे एक भव्य सप्तमातृकापट आहे. वीरभद्र (नंदी), ब्राह्मणी (स्त्री), माहेश्वरी (नंदी), कौमारी (मोर), वैष्णवी (गरुड), वाराही (वराह), ऐंद्राणी (हत्ती), चामुंडा (कुत्रा) आणि शेवटी मोदकपात्रासह गणेश असा हा शिल्पपट.
ब्राह्मणीचे वाहन नेहमी हंस असते, इथे मात्र ते स्त्रीरूपात दाखवलेले आहे. प्रत्येक मातृकेच्या हाती अथवा मांडीवर त्यांची बाळे आहेत. वाराही ही वराहमुखी दाखवली असून चामुंडा तिच्या नेहमीच्या भयप्रद रूपात आहे.

a

ह्याशिवाय खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातदेखील दोन सप्तमातृकापट आहेत.

a

a

आता मातृकांची काही एकल रूपातील शिल्पे पाहू या. (सर्व शिल्पे कायगाव टोके मंदिरातील)

माहेश्वरी - डमरू, खड्ग, नाग, वाहन- बैल

a

कौमारी -कमंडलू, पुस्तक, बीजापूरक आणि पंखा, वाहन - मोर

a

वैष्णवी - शंख, चक्र, कमळ, वाहन - गरुड

a

ऐंद्राणी - पाश, अंकुश, वाहन - हत्ती

a

वराहमुखी वाराही - वाहन - महिष

a

याशिवाय चामुंडेची स्वतंत्र शिल्पे तर पुष्कळ दिसतात, चामुंडा ओळखणे तर अगदी सोपे. मातृकापटांतील चामुंडेचे वाहन प्रेत, शृगाल, घुबड अशा भिन्न रूपांत दाखवलेले असले, तरी एकल चामुंडा मूर्तीत प्रेत हे वाहन असते. चामुंडेच्या पोटात विंचू असतो, जो तिच्या भुकेचे प्रतीक आहे. हातपायांचा अस्थिपंजर असून स्तन लोंबते असतात. रूप कराल असून दाढा विचकलेल्या असतात. भयप्रद स्वरूपाची चामुंडा बर्‍याच वेळा शीळ घालण्यार्‍या मुद्रेत असलेल्या दिसून येते.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील चामुंडा

a

पिंपरी दुमाला येथील चामुंडा मूर्ती

a

सर्वात शेवटी भुलेश्वर येथील सर्वांगसुंदर चामुंडा पाहू.

a

अष्टदिक्पाल आणि मातृका आपण वरील लेखात विस्ताराने पाहिले. आणखीही माहिती देता आली असती, मात्र ती तांत्रिक आणि किचकट झाली असती - उदा., पुराणांत वर्णन केल्याप्रमाणे असलेले त्यांचे रंग, त्यांच्या वाहनांचे विस्तारपूर्वक वर्णन, शिल्पशास्त्रात असलेली त्यांची संस्कृत वर्णने. येथे मी त्यांची सर्वसाधारण माहिती येथील मंदिरांच्या अनुषंगाने आणि ह्या मूर्ती सहजी ओळखता येईल अशा प्रकारे मांडली. काही शिल्पे भग्न झाल्यामुळे त्यात कदाचित काही त्रुटी असण्याचा संभव आहे - उदाहरणार्थ, खिद्रापूर मंदिरातील निर्ऋती आणि कुबेर यांच्या मूर्तीत गल्लत झाली असण्याचा संभव आहे. घोडा असलेली मूर्ती कदाचित कल्कीची असू शकते आणि नरवाहन असलेला निर्ऋती हा कदाचित कुबेर असू शकतो. मूर्ती उंचावर असल्याने आणि छायाचित्रातील लक्षणे पुरेशी स्पष्ट दिसत नसल्याने ही चूक होऊ शकते. इतर स्रोतातून अधिक माहिती मिळाल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद.
 
http://www.misalpav.com/node/50642

गणपतीचा शोध

 
लोकहो,

लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्‍यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.

पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्‍या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतीं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.

यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.

अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.

एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.

जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहीती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्‍यांच्या पुस्तकात मिळाली. मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.

कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे? मूळ वैदिक देवांना मुख्य आराध्यदैवते केली तर (घरातील बालकांसाठी) तोटा असा, की घरातले सण बाहेरच्या समाजातील सणांशी जुळत नाहीत. तोटा तसा फार मोठा नाही, पण हा विचार मनात सहज आला.

ख्रिस्तजन्माचा सोहळा डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान साजरा करण्याची प्रथा आहे. पण त्या प्रथेला ख्रिस्तकथेच्या प्राथमिक ग्रंथांत आधार नाही. प्राचीन काळातल्या अल्पसंख ख्रिस्ती लोकांनी ती तारीख का निवडली? याबाबत कयास म्हणून सांगतात, की मकरसंक्रांती/हिवाळ्याची सोल्स्टिस आदला बहुसंख्य समाज साजरा करत असे. त्या आनंदमय प्रसंगात आपलाही सण प्राचीन ख्रिस्ती अल्पसंख्याकांनी योजला असावा. ज्यू लोकांचा एक दुय्यम सण "हानुका" डिसेंबरमध्ये येतो, तो सण गेल्या काही दशकांत ज्यू लोक मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. ही तर आपल्या एक-दोन पिढ्यांतली कथा.

बहुधा गणेशपूजा हद्दपार केलेले लोक साधारण त्या तिथीच्या आसपासचा दुसरा कुठला सण धूमधडाक्याने साजरा करू लागतील...

   

    कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे?

कोणत्याही देवतेने ती जागा घेतलेली नाही. आमच्याकडे आता देवच नाही.

    कुतूहल म्हणून विचारतो : गणपतीला हद्दपार केल्यानंतर ती जागा (मुख्य आराध्यदैवताची) कुठल्या देवतेने घेतली आहे?
    कोणत्याही देवतेने ती जागा घेतलेली नाही. आमच्याकडे आता देवच नाही.

गणपती बुद्धी देतो, असं म्हणतात ते खरं ठरतंय म्हणायचं. Wink मलाही अशीच गणपतीनं बुद्धी दिली होती.
तर्कतीर्थ, कृपया प्रतिसाद हलकेच घ्यावा, ही विनंती.


रोचक लेख. लेखकाने अनेक उपयुक्त संदर्भ दिलेले आहेत याबद्दल आभार व्यक्त करतो.
या निमित्तानी मा. ना. आचार्य यांच्या "ध्वनिताचें केणें" या ग्रंथातल्या गणपतीविषयक संदर्भाचे पुन्हा एकदा वाचन झाले. त्या लेखात अनेकानेक संदर्भ आहेत त्यांची निव्वळ यादी देतो म्हणजे केवळ एखाद्या लेखातून या दैवताबद्दल किती दिशांनी आणि किती खोलवर माहिती मिळवता येते त्याचे प्रत्यंतर येईल.

- ज्ञानेश्वरीच्या ग्रंथारंभी, तेराव्या नि सतराव्या अध्यायातल्या गणेशाचा उल्लेख.
- "मूळ अनार्य यक्ष सृष्टीतील दैवताची, ऋग्वेदातल्या ब्रह्मणस्पती या दैवताशी सांगड घातली गेली असावी" असा (श्री. आचार्य यांचा स्वतःचाच ?) अभ्युपगम.
- या निमित्ताने यक्षसृष्टीच्या लोकसाहित्याची महाभारतादि काव्यपुराणांवाटे आणि ऋग्वेदातील उल्लेखांद्वारे वैदिक संस्कृतीशी जोडले जाणे, यक्षांचे वर्णन.
- कथासरित्सागर या ग्रंथाच्या सुमारे तिसर्‍या शतकातल्या पैशाची भाषेतल्या मूळ आवृत्ती आणि अकराव्या शतकातल्या मराठी आवृत्तीमधील "विघ्नदेवते"चे उल्लेख. या निमित्ताने इस पूर्व ६०० पासूनचे यक्षपूजेचे उल्लेख . त्यातून सिद्ध होत असलेला गणेशाचा "ग्रामदैवता"बद्दलचा संदर्भ.
- लोकसाहित्यातील शिव या अनार्य देवतेचे गणेश या दुसर्‍या अनार्यदेवतेचे पितापुत्र असे नसलेले नाते. त्या दोन्ही दैवतांचे लोकनृत्यसापेक्ष उल्लेख.
- ऋग्वेदातल्या "गणपती" या देवतेचे उल्लेख. आणि ब्रह्मणस्पती या देवतेशी स्थापित केलेले एकरूपत्व.
- अथर्वशीर्ष हे मूळ अथर्ववेदाच्या संहितेत नसणे. गणेशदेवतेचे वैदिक देवतामंडलात प्रवेश झाल्यानंतर अथर्वशीर्षाचे त्या वेदाला जोडले जाणे
- वेदांचय निर्मितीनंतर अनेक शतकांनी लिहिल्या गेलेल्या कर्मकांडाची वर्णने असलेल्या वेदांगांमधील "विनायकशांती"सारख्या गोष्टी,
- स्मृतींमधे येत गेलेले गणेशदेवतेचे उल्लेख.
- एकंदर वैदिक साहित्य , पुराणे , स्मृती यांच्यात सामील केल्या गेल्यानंतरही अन्य पुराणादि साहित्यात "अनार्य दैवत" म्हणूनही गणेशाचा उल्लेख सापडणे. (डब्बल रोल !)
-शिवपुराण, स्कंदपुराण , ब्रह्मांडपुराण अशा विविध ठिकाणी थोड्याबहुत फरकाने आलेली "गणेशजन्मा"ची कथा Smile

क्रमशः सध्या इथेच थांबतो. अजून अर्धे संदर्भ देणे बाकी आहे. वेळ झाला की देतो. मुद्दा असा आहे की , एकंदर देवता कशा बनत गेल्या याचा इतिहास वेदपूर्वकालीन अनार्य संस्कृतीपासून, मग वेदांपासून , नंतर जन्माला आलेल्या साहित्याशी, त्यानंतर आलेल्या बौद्ध धर्मादि गोष्टींशी वगैरे अनेक शाखाप्रशाखांनी जोडला गेलेला आहे. आचार्यांच्या एका चॅप्टरमधील निव्वळ संदर्भ देताना दमछाक होते. तर मग त्यातील कालानुक्रम ठरवणे , अस्तिपक्ष, नास्तिपक्ष आदि ठरवणे , त्यात लिखित नसलेला इतिहास, पिढ्यापिढ्यातून वहात आलेल्या ज्ञानाच्या निरनिराळ्या आवृत्त्या...एकंदर हा प्रदेश निबीड म्हणायला हरकत नाही.

बाकी प्रस्तुत लेखात गणपतीला घराबाहेर वगैरे काढणे म्हणजे काय ते नीटसे समजलेले नाही. ते असोच. Smile

माझा प्रतिसाद दिल्यानंतर तुमचा हा प्रतिसाद वाचला!
लेखक व प्रतिसादक दोन्हीकडून आलेल्या माहीतीमुळे माझा मेंदु हँग झाला आहे!

सविस्तर चर्चेतून योग्य अशी माहीती मिळेल असे वाटत आहे, वाट पाहतो आहे.

असेल गणपती अनार्यांचा देव. म्हणून तो नीच कसा? म्हणजे तुम्ही अनार्यांपेक्षा उच्च आहात का?

हे सारे अंधुक आठवणीतून लिहितोय...
नीच वगैरे शब्दांचा वापर आज आपण करतो त्याच केवळ संदर्भांसह नाही. या शब्दाची संदर्भचौकट त्याहून अधिक व्याप्त आहे. पुढे त्यात आजच्या संदर्भातील नीच हा अर्थही आल्याचा प्रवास आहे. त्या अर्थी, गणपती ही अनार्यांची देवता म्हणून आर्य तिला नीच मानत, कारण आर्यांच्या लेखी अनार्य नीचच असत, असा तो प्रवास आहे.
२००२-०३ साली केव्हा तरी नामदेव ढसाळांनी 'सर्व काही समष्टी'साठी या त्यांच्या 'सामना'तील स्तंभात या विषयाचा अगदी बारकाव्यांसकट उहापोह केला होता, तोही यानिमित्त आठवला.

>>अनार्यांची देवता म्हणून आर्य तिला नीच मानत, कारण आर्यांच्या लेखी अनार्य नीचच असत,

पण म्हणून आता आपल्यापैकी कोणी अनार्य्/गणपती नीच असं म्हणायचं काही कारण नाही.

(हा पुढचा भाग श्रामोंसाठी नाही. लेखकासाठी आहे) त्यातूनही प्रत्येकालाच कोणत्याही देवाला मानण्याचं/न मानण्याचं स्वातंत्र्य आहेच. मग अमूक देव उच्च आणि अमूक देव नीच असं कोणी म्हणू नये. शिवाय अनेक ठिकाणी नाग, बैल, वारूळ, लिंग इ. अनार्यांचे देव पूजेत असतातच. भले तुम्हाला पटू दे किंवा कसेही.

म्हणून दुसर्‍या एखाद्यापेक्षा आम्ही उच्च असा अर्थ आपल्या बोलण्यातून ध्वनित होऊ नये याची काळजी घेतली तर फार बरं. अर्थात तुमचं उच्चार स्वातंत्र्य तरीही मी मान्य करते आहेच!

आताच मातोश्रींना या लेखाची प्रिन्ट काढून देतो, तसेच तुम्ही लेखात उल्लेख केलेले साहित्य देखील कोठे मिळेल ते पाहतो.

* लोकायत बद्दल काहीच माहीती नाही आहे कोणी सविस्तर माहीती देऊ शकते का?

चांगली माहिती. याबद्दल ससंदर्भ लिहिण्याइतका संदर्भ जवळ नाही मात्र काही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी (जसे मासिकांतील लेख, व्रुत्तपत्रे इत्यादी) वाचल्या त्यावरून मुळ भारतातील जमाती टोबा ज्वालामुखीच्या स्फोटानंतर नामशेष झाल्या. काही जंगली जमाती उरल्या (किंवा नंतर दक्षिणपूर्वेतून आल्या) त्यांच्यापैकी 'गण' या जमातीचा नेता तो गणपती. आर्य आल्यानंतर त्यांनी विविध मार्गाने वैदिक धर्माचा प्रसार केला व मान मिळवुन दिला. ज्यात साम-दाम-दंड-भेद सार्‍या निती अवलंबिल्या. शंकर आणि त्याला मानणार्‍या अनेक जातींशी युद्ध करण्यापेक्षा त्यांनी त्यांना वैदीक धर्मातच वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी सामावून घेतले. त्यापैकीच 'गण' जमातीशी युद्ध करून बघितले पण त्यांचा नेता अति पराक्रमी असल्याने त्यांना जमले नाही. त्या नेत्यानंतर त्यालाच प्रथम वंदन स्थानी बसवून तो अख्खा समाज वैदिक समाजात सामावता आला.

असे प्रकार आताहि बघायला मिळतातच की. गॉन्दालूपे ला चर्चने असेच मेरीचा अवतार घोषित करून मेक्सिकन समाज फारसे रक्त न वहाता ख्रिस्तमय करुन घेतले होते

तुम्ही नकळतपणे ज्या प्रोसेसचा उल्लेख केला आहे तो म्हणजे "देवतांचे उन्नयन".
हा एक आत्यंतिक खोलात खोलात घेउन जाणारा आणि नंतर त्याच खोलीत बुडवणारा विषय आहे. जसे गणांचा अधिपती तो गणपती असे त्याचे पूर्वीचे रूप तसेच वैदिक "रुद्र" देवता व तत्कालिन अवैदिक "शिव" ह्यांचे एकीकरण होउन एकच "शंकर भगवान " तयार झाले.
वेदांतील साइड हिरो, इंद्र, वरूण, मित्र्,अग्नी ह्या प्रमुख देवतांचा सहाय्यक असणारा "विष्णु" सुद्ध नंतर अनेक अवैदिक लोक कथांत मिसळून जाउन नंतर "देवांचा देव महाविष्णु" बनला असे म्हणतात.
स्थानिक लोककथांचे नायक राम्-कृष्ण हे खरे तर अवैदिक (किंवा निदान अ-वैष्णव तरी) म्हणता यावेत. ह्यांनाच खुद्द विष्णुचा अवतार मानले गेले.
पंढरपुराचा पांडुरंग-विठ्ठल,राजस्थानचे "श्रीनाथजी" , दक्षिणेतील अय्याप्पास्वामी हे सर्व खरेतर स्थानिक देवच. तेवढ्यातेवढ्या इलाक्यापुरता ह्यांचा प्रचंड बोलबोला. आजच्या भाषेत बोलायचे तर जब्बरदस्त फॅन फॉलोइंग किंवा "कल्ट" पण मर्यादित भूभागावर सुरुवातीला होता तसा.
जसे रजनीकांत नावाची कुणी के प्रभावशाली व्यक्तिमत्व दक्षिणेत उदयास आलेले आहे, व त्याचेही कल्ट तूफान आहे.(हो . Rajni is not a demi god. he can only be equated to the God from his fans perspective.)पण रजनीची तेवढी क्रेझ उत्तरेत नाही.
झाले काय, की कालप्रवाहात ह्यातल्या प्रत्येकावर वैदिक गुण आरोपित केले गेले.मग शतकानुशतके कथांची एक गुंफण सुरु झाली. दीर्घकाळ सुरु असलेलीए गुंत इतकी वाढली की वैदिक साच्यावर अवैदिक मुलामा चढलाय की अवैदिक ढाच्यावर वैदिक कल्प्नांचे नक्षीकाम केले आहे हे कळणे अशक्य झाले. म्हणजे "श्रीनाथ"जी विष्णुचा अवतार मानला गेला.(हा देव सिथियनांनी,राजपुतांच्या पूर्वजांनी मध्य पूर्वेतून का मध्य आशियातून आणला होता म्हणे.) पांडुरंगाचे विष्णु-शिव दोघांशीही एकीकरण इथल्या संतांनी सुरु केले,कित्येक अभंग आहेत,घरि पोचल्यावर दुवे देउ शकतो. अय्याप्पा म्हणजे कार्तिक स्वामी का मोहिनीरुपी विष्णु-शिव ह्यांचा पुत्र असे काहीतरी आहे. थोडक्यात, स्थानिक जमाती पूजा करायच्याअच ह्या देवांच्या त्यांच्यासमर्थनार्थ वैदिकांनी आअपाअपल्या ष्टोर्‍या तयार केल्या. काअही पुरानात टाकल्या, काही वेदांतात प्रक्षिप्त भाग म्हणून टाकल्या. काही कुठेही न टाकता तशीच पूजा सुरु ठेवली "वेदांनाही नाही कळला " म्हणत.
      भरिला भर म्हणजे तिकडे बौद्धमताचा उगम झालेलाच होता. मग जिथे तिथे त्यांचाही प्रभाव, तिथल्या संकल्पनांचेही प्रकटीकरण सुरु झाले. जसे आर एस एस वाले(संघ परिवार school of thoughts) आणि पु ना ओक वगैरे प्रत्येक गोष्टीचे पूर्वज वैदिकच होते अशी सर्व सजीव्-निर्जीव वस्तूंची व्म्शावळ लाउन दाखवतात. तस्सेच आपण उल्लेख केलेले कोसंबी(कोसंबी school of thoughts) हे प्रत्येक गोष्टीचे नाते बौद्ध मताशी लाउन दाखवतात. उदा:- पंढरपूर्,पूर्वेचे पुरी (जगन्नाथ यात्रावाले) मठ व इतरही बरेच काही(अगदि रामायण वगैरेसुद्धा) आधी बौद्धांचे होते आणि मग नवप्रणित हिंदुंनी पाचव्या-सातव्या शतकानंतर शक्तीप्रयोगाने ढापले असे म्हणतात.
असे स्थानिक देव आजही दिसतात. चाळोबा,वेतोबा,भैरोबा हे सगळे स्थानिक भूभागातले कोकणातले वगैरे देव. तिथे पोचलेल्या वैदिक वाल्यांनी "हे तर आमच्या शिवाचे/रुद्राचे अवतार" असे सांगत्त्यांचे रूप मानून पूजा सुरु केली. अगदि पुण्यात हिंजवडित "म्हातोबा देवस्थान " आहे. हाही स्थानिक देवच. वैदिक लोक शंकराचा अवतार मानतात.
   अजून एक कंगोरा म्हणजे पशूपूजा. म्हणजे आधी त्या देवतेची ज्या मूळ रुपात पूजा होइ, ते मूळ रूप नंतर "सुसंस्कृत " वाटेना. "सुसंस्कृत माणसाने पशूच्या पाया पडायचे? छे छे. काहितरीच." असे वातू लागून मग मूळ रूप त्या-त्या देवाचे वाहन बनले व देवाचे नवे रूप मानवी/सुसंस्कृत भासणारे झाले.उदा:- पाकमधील हडप्पा-मोहेंजोद्डो इथले अवशेष तसेच गुजरातेतील लोथल येथील अवशेषात पुष्ट वशिंड असलेल्या बैलाची पूजा होताना दिसते. हा अतिअतिप्राचीन काळ. त्यानंतर ह्याच देवतेचे मानवी रूप शिव्-रुद्र ह्या नव्याने तयार होत असलेल्या देवतेत टाकले व तो बैल "नंदी"च्या रुपाने मंदिरात विसावला.

थोडक्यात सध्याचे देव म्हणजे अशा अनेकानेक कथा,कल्प्ना,समजुती,लोक्-कथा व काहिसा शक्तीप्रयोग ह्या सर्वांचे एक वेगळेच भेंडोळे(स्पाघेत्ती) बनलेला आहे.

आता वैष्णो देवी, वणी-माहूर्,दुर्गा,सरस्वती,लक्ष्मी इकडे वळुयात.
अर्र्र र्र नको नाहितर. फार अवांतर होतय वाटतं.

मला म्हणायचय इतकच की तुम्ही गणेशाचा उल्लेख केला तसे उन्नयन(developement and mixing up with local deity)
प्रत्येक देवतेचे झालेले आहेच. हे जगभर अभ्यासले जाणारे एक शास्त्र आहे, समाजशास्त्राचे उपांग म्हणून हे येते, लोक कथा व लोक मानस समजून घेण्यासाठी.

टिपः-
१.मी वापरलेले शब्द आहेत वैदिक्-अवैदिक(संस्कृती उद्देशक). आर्य्-अनार्य(वंश उद्देशक) असे शब्द वापरले नाहित. आर्य्-अनार्य असे खरेच काही होते की नाही ह्याबद्द्ल केवळ लोकांचे हवेतील तर्क आहेत. "आर्य" नावाचे लोक भारताबाहेरून कुठूनतरी आल्याचे अजून कुठेही पुरेसे पुरावे मिळालेले नाहित.आले असतीलही, नसतीलही.
२.अधिक माहिती संक्षिप्त रुपात हवी असल्यास रं ना गायधनी ह्यांचे यु पी एस सी च्या जुन्या अभ्यासक्रमातील इतिहासाचे संदर्भपुस्तक पहावे. त्यांनी चांगला आढावा घेतलाय. जालावर संजय सोनावणी ह्यांनी "पांडुरंग" ह्या स्थानिक देवतेबद्द्ल त्यांच्या ब्लॉगवर बराच उहापोह केलेला आहे.


प्रमुख संदर्भांचा उल्लेख माझ्या प्रतिसादाच्या शेवटी टिप २ मध्ये केलेलाच आहे. पुस्तक असे म्हटले तर यु पी एस सी ची काही पुस्तके आहेत, त्यातले मला महत्वाचे वाटलेले उल्लेखले.
पांडुरंग ह्या देवतेसंदर्भात ब्लॉग म्हटलो तो हा http://sanjaysonawani.blogspot.in/2011/07/blog-post_04.html
असाच गाजलेला ब्लॉग म्हणजे खट्टामिठा डॉट कॉम्. ह्यावर बरिच उलटसुलट्, काहिशी अनवट व कधीकधी स्फोटक माहिती येत असे.
ह्याशिवाय विसुनाना ह्या आयडीचे उपक्रम, मिपावरील प्रतिसाद.
सात्-आठ पेप्रात(मागील वीसेक वर्षात) रोज छापून येणारे इतिहास ,लोककथा ह्यासंबंधी काहीही.
हे सर्वच माझे बौद्धिक खाद्य आहे.नक्की काहितरी एकच असे नाही सांगता येणार. अगदि कशातूनही कशाचाही संदर्भ लागू शकतो.
RSSवाले अगणित साहित्य छापील रुपात प्रकाशित करतात्,जालावरही करतात(evivek)त्यातले सारेच काही भक्कम पुराव्यानिशी नसले तरी त्यानिमित्ताने बरेच लीड्स मिळतात. पण त्यांच्या ह्या साहित्याचे,पुस्तकांचे नावे लक्षात ठेवत मी बसत नाही,मला ते जमत नाही.तीच गत सावरकरी साहित्याची. सावरकरांचे समग्र साहित्य जलावर आहेच. कधीही पुस्तक प्रदर्शनात्,लायब्ररित,क्रॉसवर्ड मध्ये जाउन हाताला लागेल ते मायथॉलॉजीचे समजेल त्या भाषेतले उभ्या उभ्या (फुकटात)वाचत बसतो.त्यात राजवाडे,शेजलवलकर,कुरुंदकर आले, तसेच कोसंबीही आले.त्यातले जवळ जवळ कुठलेच पुस्तक माझे १००% वाचून पूर्ण होत नाही. ठळक मुद्दे,बुलेट पॉइंट्स काय ते लक्षात राहतात.
उपक्रमाच्या जुन्या चर्चांतूनही बरेच काही सापडते.
हां, आता मला कुणी म्हणाले की "बोल कुठल्या पुस्तकात काय दिलय? महिकावतीची गाजलेली बखर ,ज्याच्या नुसत्या प्रस्तावनेत राजवाड्यांनी यादवकालीन आख्ख्या महाराष्ट्राचा,यादव्,कोली,भिल्ल अशा सर्वच सत्ताम्चा आढावा घेतलाय, त्या पुस्तकाचे नाव काय?" तर माझी तंतरते. म्हणजे मुद्दे आठवतात. शिलाहार्,कदंब्,नागरशा,भिल्लण यादव्,रामदेवराय,हेमाद्रीपंत बरेचसे आठवते, पण नक्की कोण कोणत्या पुस्तकात त्यांनी कोणकोणत्या काळाचा उल्लेख केलाय काहीही आठवत नाही.
थोडक्यात , रोजच्या आपल्याला बातम्या आठवतात तसेच काहिसे.आपण "काय" वाचले, हे आठवते. "कुठे" वाचले हे आठवत नाही. दिवसाला ५-७ वर्तमानपत्रे,जालपत्रे वाचणार्‍यांना माझी अडचण समजू शकेल.उदा :- वीसेक वर्षांपूर्वी राजीव गांधींचा खून झाला १९९१ मध्ये हे आपल्याला आठवते. अगदि स्फोटानंतरचे विदारक फोटोही आठवतात. पण तेव्हा आप्ण ते "सकाळ" मध्ये पाहिले होते की "लोकसत्ता"मध्ये हे म्हणजे अजिबात आठवत नाही.
तुम्ही एकाच पेपरशी एकनिष्ठ असाल तर ही अडचण येणार नाही. पण मी ह्याबाबतीत शब्दशः "सर्वभक्ष्यी" आहे. आजही तिसरी-चौथीच्या इयत्तेतील "छान छान गोष्टी" वाचतो. माझ्या नवबौद्ध मित्रांकडे जाणे झाल्यावर त्यांच्या आंबेडकरी ध्येयास वाहून घेतलेल्या वर्तमानपत्रातील सर्व लेख वाचतो. त्यातून बुद्धाच्या जातक कथांचा अंदाज येतो. डिस्कवरी,फॉक्स हिस्टरी वगैरेंचे माहितीपटही पूरक ठरतात. थोडक्यात, कुठलाच एक निश्चित असा सोर्स नाही.
लहान मुलाने मोठ्यांच्या ताटात वाढलेली मस्त गोडगोड बुंदी/नुक्ती भसाभसा ओढून आपल्या ताटात घेउन बकाबका खायला सुरुवात केली आणि जर त्यास विचारले की "आता सांग ह्यातली आईच्या ताटातून घेतलेले बुंदीचे दाणे कुठले आणि बाबांच्या ताटातून घेतलेले कुठले" तर बिचारे निरागस पोर जसे
दचकून तुमच्याकडे पाहिल तशीच काहिशी माझी स्थिती होते.
उदा:- महाराष्ट्रात पाथरवट समाज जो आज दगडफोडीचे काम अल्प मोबदल्यासाठी करतो,त्यांची प्रमुख वस्ती कुठे कुठे आहे ह्याबद्दल एका एनजीओचा रिपोर्ट होता. त्यांची स्थिती वर्णन केली होती.काहिंच्या मुलाखती होत्या. भारतात जागतिक दर्जाचे अचाट वाटणारे शिल्पकाम ह्याच समजाने केले होते.(वेरूळ्-कैलास पासून ते ऐहोळे-बदामी,मदुरै वगैरे बरेच काही.). झाले. त्या वस्तीचा अंदाज घेत गेल्यास एक गोष्ट सहज लक्षात येते की आजही पाथरवटांची अशाच रस्त्याच्या आसपास आहे, जो इब्न बतूता वगैरे भटक्या प्रवाशाचा मार्ग होता. कोणे एके काळी व्यापारी मार्ग होता; पुढे जाउन रेशीम मार्गला हाच मर्ग जोडला जात होता. म्हणजेच शिल्पकला केवळ गुहांत न करता लहानसहान भांडी व इतर ठिकाणी करुनही हा समाज विकत असे असे शक्य दिसते. ह्यासाठी पुरावा काय? म्हटले तर काहिच नाही. म्हटले तर बरेच काही.

मुसुंबद्दल जाहिर तक्रारः- "मी " , "माझे", "मला" असे लिहित बसणे मला स्वतःलाच कसेसेच होते. वाचणार्‍यांनाही ते होतच असणार ह्याचाही अंदाज आहे. पण संदर्भ मागितल्यावर मी पुरेसे संदर्भ का देउ शकत नाही हे सांगण्यासाठी "मी माझे मला" शब्द वगळून प्रतिसद लिहिणे जमले नाही.
तस्मात मुसुंबद्द्ल सर्व वाचकांतर्फे (विशेषतः सदर प्रतिसादाने डोक्याला शॉट्ट बसलेल्यांतर्फे) मी तक्रार करु इच्छितो व दोष तिकडेच ढकलू इच्छितो.

सविस्तर उत्तराबद्दल आभार.
हा थोडा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु डेटा-वेअरहाऊसिंग च्या मूलभूत संकल्पना आपण इथे आपण वापरू शकतो. अनेक ठिकाणाहून येणारा, मोठ्या प्रमाणातला डेटा , त्याचे प्रमाणीकरण , तो योग्य-अयोग्य आहे की नाही याची छाननी, विषयवार वर्गवारी, संदर्भांचे व्यवस्थित पुंजीकरण या गोष्टींनाही काही महत्व आहे हे वेगळं सांगायला नको. हे करण्यात बरेच श्रम खर्च होतात हे मान्य आहे. किंबहुना व्यक्तीगत माहितीच्या संचयामधे असं करणं कदाचित फार कमी प्रमाणात आवश्यक आहे हेही खरं. मात्र तुम्ही ज्या प्रमाणात डेटा कन्झ्युम करत आहात ते पहाता अशा स्वरूपाची शिस्त अगदी कमीत कमी प्रमाणात का होईना पण स्वीकारली नाही तर लवकरच "हे खरं की ते खरं" किंवा "अधिक अचूक माहिती काय" अशा प्रश्नांची तड लावणं कठीण होऊन बसेल.

प्रस्तुत प्रतिसाद मन यांना व्यक्तिगत उपदेशपर नसून, ज्ञानमार्गामधे जे अनेक खाचखळगे लागू शकतात त्यांपैकी एका महत्त्वाच्या बाबीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे एवढेच नम्रपणे नमूद करतो.

गणपती या देवाचा इतिहास आणि गणपतीची भक्ती करणं हे दोन वेगळे विषय तुम्ही वैयक्तिक आयुष्यात कशाने जोडले आहेत? तुम्ही ज्या गणपतीची भक्ती करत होता त्या कारणांना तो अनार्यांचा देव होता या नविन माहितीमुळे कसा सुरुंग लागला? आज ज्या गणपतीची अनेकजण भक्ती करतात तो गणपती आणि वैदिक काळातला किंवा अगदी दोन-चार शतकांमागच्या गणपती वेगळा असल्याने काय फरक पडतो? आज केली जाणारी भक्ती आज ज्या गणपतीच्या "प्रतिमेला" लोक मानतात त्यानुसारच आहे ना?

(अवांतरः मुळात इतिहासाच्या अभ्यास "भक्ती" वगैरे भावनाच अस्थानी आहत. पण ते असो.)
मनोरंजक लेख आहे.
गणपतीच्या दिवसात हापिसात जायला जो त्रास व्हायचा तो साहून तेव्हाच गणपती हा विघ्नकर्ता आहे अशी शंका आलीच होती.
अजूनही काही शंका आहेत.
गणपतीची सोंड म्हणजे काय?
उजव्या सोंडेचा आणखी त्रासदायक असतो असे का?
वगैरे वगैरे. उत्तरे अर्थातच अपेक्षित नाहीत कारण त्यावाचून काहीही अडलेले नाही.

वरील चर्चेत एक मजेशीर गोष्ट दिसून येते. ती म्हणजे गणपतील "नीच" मानले गेलेले काही जणांना रुचलेले दिसत नाही. पण गणपतीच्या विघ्नकारकत्वाबद्दल कोणीच बोलत नाही. आर्यांच्या यज्ञयागादि नित्य कर्तव्यात इथल्या मूळ लोकांनी त्रास देऊन विघ्ने आणली असणार. ही प्रवृत्ती आज ही टिकून आहे. एखाद्या समूहात नवे घटक सामील होतात तेव्हा त्याना सरळ प्रवेश फार थोड्या वेळेस मिळतो. त्यामुळे त्रास देणारे, विघ्ने आणणारे नीच मानले गेले तर त्यात नवल काय?
तुमचे पूर्वज अनार्य होते असं जर तुम्हाला कधीतरी पक्कं कळलं तर?

"स्मृती/वेद मानणार्‍या, उच्च(गृहीतक) अशा आर्य(गृहीतक) कुलात जन्म घेउन मी एका देवतेची उपासना भौतिक सुखांसाठी करत होतो, ती देवता नीच(दुसर्‍या जातीतली) आहे हे समजल्यावर मी तिला माझ्या घरातून घालवून दिले." ??

गणपती (आणि त्याजागी इतर कोणीही देवता) मानणे आणि न मानणे यात घडलेला प्रवास रंजक आहे. काहींचा नेमका याच्या उलटा प्रवास होतो (असं सांगितलं आहे अनेकांनी/ अनेकींनी मला) तोदेखील तितकाच रंजक असतो. गणेशभक्ती एका अर्थी ग्रंथप्रामाण्यावर आधारित होती (गणपतीचे स्तवन नियमित केल्यास यश मिळत ही धारणा) आणि 'गणपतीला घरातून हद्दपार करणं' घडलं तेही काही ग्रंथाच्या आधारे - म्हणजे पुन्हा ग्रंथप्रामाण्य आलच इथेही.

जी वस्तू उपयोगाची वाटत नाही ती माणूस सामान्यपणे टाकून देतो असं दिसत आजुबाजूला साधारण दृष्य. गणपतीच स्थान बदललं हे कळलं लेखातून काही अंशी, पण हा बदल कसकसा होत गेला, तो होताना तुम्ही कोणकोणते टप्पे ओलांडलेत अस काही वाचायला मला जास्त आवडलं असत.

गणपती यज्ञ करणा-या आर्यांच्या दृष्टीने विघ्नकर्ता होता यात काही विशेष नाही - पण कोणाच्यातरी दृष्टीने तो संस्कृतीरक्षकही असेल, आपल्याला काय माहिती? त्यामुळे उच्च देवता, नीच देवता हे शब्दप्रयोग भक्तांचा त्या काळचा सामाजिक स्तर दाखवतो (समाजमान्य स्तर- शेवटी तो ठरवणारे सत्तावान लोक असतात त्या काळातले) - देवता शेवटी एका अर्थी मनुष्यनिर्मितच असतात!

"....गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो...."

व्वा. काय हृदयस्पर्शी कारण आहे तडफडण्यासाठी !
ख्रिस्तोफर कोलंबस तडफडत होता साता समुद्रावर 'इंडिया' नावाच्या देशाचा शोध लावण्यासाठी
सर रिचर्ड बर्टन मक्कामदिनेच्या शोधासाठी तडफडत होते, हजारो मैलाच्या रणरणत्या वाळवंटातून जाताना.
एडमंड हिलरी आणि तेनसिंग नोर्गे तडफडत होते, एव्हरेस्टवर झेंडा फडकविण्यासाठी.
एडवर्ड जेन्नर रात्रंदिवस तडफडत होता 'देवी' ची लस शोधून काढण्यासाठी.
विवेकानंद तडफडत होते हिंदु धर्मातील बंधुत्वाची शिकवण जगभर जाण्यासाठी.
मिल्खासिंग जीव तोडून धावत होता, तडफडत होता भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी.
---- पण आता या तडफडण्याच्या व्याख्येत "अमुक एक देव नीच कसा ?" हे सिद्ध करणारा पुरावा शोधणार्‍याचाही समावेश करावा लागणार असे दिसते.

घोरी, गझनी, औरंगझेब, अफझलखान, अब्दाली यानी स्वतःच्या धर्मप्रसारासाठी हिंदुच्या देवतांचे 'मूर्तीभंजन' करण्याचा सपाटा लावला होता, त्यासाठी वेळोवेळी रक्तपातही घडवुन आणले, पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य. [कालपर्यंत समाजात ज्या हाडामासाच्या व्यक्तीना त्यांच्या कार्यामुळे दैवत्व प्राप्त झाले होते ते कसे गैरलागू वा अस्थानी आहे हे सिद्ध करण्याची अहमहमिका विविध संस्थळावर लागली होती, ती आता 'थेट देव' या प्रकृतीवर येणार हे निश्चित झाले आहे. आज 'एलेफंट गॉड' नीच झाले, उद्या 'मंकी गॉड' चा नंबर लागणार.]

    पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य. [कालपर्यंत समाजात ज्या हाडामासाच्या व्यक्तीना त्यांच्या कार्यामुळे दैवत्व प्राप्त झाले होते ते कसे गैरलागू वा अस्थानी आहे हे सिद्ध करण्याची अहमहमिका विविध संस्थळावर लागली होती, ती आता 'थेट देव' या प्रकृतीवर येणार हे निश्चित झाले आहे. आज 'एलेफंट गॉड' नीच झाले, उद्या 'मंकी गॉड' चा नंबर लागणार.]
हा प्रकार त्या लाटेतला वाटत नाही. किंचित वेगळा असावा.
तर्कतीर्थमहोदयांचा विरोध सरसकट मूर्तिपूजेला, अथवा 'देवा'च्या अस्तित्वाला असावा, असे वाटत नाही. पूज्य दैवत जोवर आर्य आहे, "ब्राह्मण"* आहे, "नीच"* नाही, अथवा मनुस्मृतीच्या अनुसार निषिद्ध नाही, तोवर त्यात त्यांना काही अडचण दिसते, असे आढळत नाही. त्यांचा विरोध केवळ अनार्य / शूद्र / ब्राह्मणेतर / मनुस्मृतीस अनुसरून त्याज्य दैवतांच्या पूजेस असावा, असे दिसते. (विरोध व्यक्तिगत पातळीवर किंवा कसे, याची कल्पना नाही.)
त्यामुळे, त्यांना मूर्तिभंजकांच्या अथवा नास्तिकांच्या पठडीत बसवता येईल, असे वाटत नाही.
* अवतरणांतील शब्दांचा नेमका (किंवा त्यांना अभिप्रेत असा) अर्थ एक तर ते स्वतःच जाणोत, नाही तर तो एक जगन्नियंताच जाणे.

    घोरी, गझनी, औरंगझेब, अफझलखान, अब्दाली यानी स्वतःच्या धर्मप्रसारासाठी हिंदुच्या देवतांचे 'मूर्तीभंजन' करण्याचा सपाटा लावला होता, त्यासाठी वेळोवेळी रक्तपातही घडवुन आणले, पण आता इंटरनेटसारखे स्वस्त माध्यम हाती आल्यावर ही मूर्तीभंजनाची जी लाट सांप्रत महाराष्ट्र देशी आली आहे ती थोपविण्याचा प्रयत्न करणारे विफल होत राहणार हे १००% सत्य.

या तुलनेशी संपूर्णपणे असहमत आहे. घौरी, गझनी इ. तलवारींच्या बळावर मूर्तीभंजन करणारे कुठे आणि इंटरनेट कुठे!! इंटरनेटवर जितका सो कॉल्ड मूर्तीभंजकांचा वावर आहे तितकाच कट्टर धर्मवाद्यांचाही आहे. (अहो पोप सुद्धा आता बायबलचे वेचे ट्वीट करतोय, आहात कुठे!) इंटरनेट हे फक्त माध्यम आहे. तिथे सर्वप्रकारची माहिती उपलब्ध आहे. जे पूर्वी मूर्तीभंजक होते त्यांना फक्त अजून एक माध्यम मिळालं आहे इतकाच काय तो फरक. जे धर्मांध होते त्यांनाही हे माध्यम तितकंच उपलब्ध आहे. इंटरनेट आल्याने अचानक कोणी मूर्तीभंजक झालेले नाही.
दुसर्‍यामुद्दयाबाबत 'न'वी बाजू यांच्याशी सहमत.
ओके, फर्गेट इट.
"इंटरनेट आल्याने अचानक कोणी मूर्तीभंजक झालेले नाही." ~ या मताबद्दल मात्र १००% सहमत. इंटरनेटमुळे इतकेच समजले की, 'ते' कार्य फक्त मुस्लिमच करतात असे नसून "प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" येथील एरव्ही दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा गणपतीसमोर रात्रंदिवस रांगा लावणारे हिंदु एलिटही करतात.... किंवा लेट अस से, करू लागले आहेत. छान प्रगती आहे सांप्रत आपल्या देशाची. कशाला पोपच्या ट्विटींगची चौकशी करायची मग ?
उद्या इंटरनेट कोसळले तरी ज्या कुणाला मूर्तीभंजनाचे कार्य अथक पुढे चालू ठेवायचे आहे ते अन्य माध्यम शोधणारच.
घोरी वगैरेंची तुलना मूर्तीभंजकांशी केलेली आवडली नाही. मूर्तीभंजन हा काही अगदीच टाकाऊ प्रकार आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी थोडी उदाहरणं दिली पाहिजेत. लहानपणी वाटतं आपले शिक्षक किती महान. पुढे आपणही ग्रॅज्युएशन वगैरे करताना लक्षात येतं की आपल्या शिक्षकांना सगळं माहित असतं असं वाटणं हा आपला खुजेपणा होता. एक-दोन शिक्षकांबद्दल हृद्य आठवणी असतात, आणि ते आता खूप चांगली माणसं म्हणून आठवतात, माहितीचा स्रोत म्हणून नाही. अशीच काहीशी प्रतिक्रिया आईवडलांबाबतही होते. दुसर्‍या बाजूने आपण लहानपणी बुवाला घाबरतो, अंधाराला घाबरतो, याला घाबरतो, त्याला घाबरतो. मोठं होताना अशी सर्व भीती निघून जाते (गेली नाही तर मानसोपचारतज्ञाकडे जाण्याची वेळ येते.) आपण कोणालातरी देव नाहीतर बुवा बनवतो आणि नंतर ते सगळं सामान्य वाटतं. हे आपल्या मनातलं मूर्तीभंजनच नाही का?
मी जेव्हा धर्म बदलून निधर्मी, नास्तिक धर्मात गेले तेव्हा माझ्यात फार फरक पडला असं म्हणणार नाही. पण नव्या धर्मातला कडवेपणा गळला तेव्हा खरं मूर्तीभंजन झालं आणि आता कोणत्याही मूर्तींबद्दल पावित्र्य वगैरे वाटत नाही आणि कोणत्याही बुवाची भीतीही वाटत नाही. मूर्तीभंजन हा शब्द मला अतिशय आवडतो. पण ते तलवारीच्या जागी लेखणी/कीबोर्डमधून होणंच श्रेयस्कर हा मुद्दा मान्य आहे.

मूळ लेखाबद्दलः गणपती तसाही मला फारसा आवडत नाही. विचार करा कोणी सोंड फुटलेला, पोट सुटलेला पुरूष उघडा समोर आला तर कसं वाटेल? पुरूषांचं ठीक आहे हो, लक्ष्मी, सरस्वतींच्या प्रतिमा कशा भारतीय पुरूषांना आवडतील अशा देखण्याच असतात.
भारताचे मूळनिवासी अनार्यच असल्यामुळे गणपती हा मूळचा आणि बाकीचे उच्च देव हे इंपोर्टेड आहेत. राज ठाकरेंनी लोकल विठ्ठलाची भक्ती सुरू करावी आणि राम, कृष्ण या भय्यांच्या देवांची उपासना करू नये अशी एक विनंती. (हे सगळं ह घ्या, घेऊ नका, किंवा कसंही!)
वैदिक प्रामाण्य मानून मूर्तिपूजेचा विरोध करणारे दयानंद सरस्वती हे गझनीच्या महंमदाच्या यादीत घातलेले मी कधीच बघितलेले नाहीत. त्याचे कारण असे असावे (आजवर त्याचे कारण शोधण्याचा विचारही मनात आला नाही) की दयानंद सरस्वतींनी स्वतःच्या अनुभवाचे वर्णन केले (पिंडीवरील प्रसाद खाणारा गलिच्छ उंदीर) आणि हिरिरीने - पण धक्काबुक्की न-करता - मूर्तिपूजेचा धिक्कार केला.
दयानंद सरस्वतींबाबत भारतात विशेष अनादर नाही - बराच आदर आहे - याबाबत अशोक पाटील यांचे मत काय आहे?
मी स्वतः वैदिक प्रामाण्य मानणारा नाही, तरी हा लेख मला साधारण दयानंद सरस्वती साच्यातला वाटला. तो तसा न वाटता गझनीच्या महंमदाच्या साच्यातला वाटण्यासारखे लेखात काय दिसले?
अर्थात दयानंद सरस्वती आणि गझनीचा महंमद हे दोघे एकाच साच्यातले आहेत, असे अशोक पाटील मला समजावून सांगू शकतील. ही कल्पना नवीन असल्यामुळे मला समजायला कठिण जाईल, हे आहेच, पण तरी कुतूहल वाटते.

ज्या धाग्यावरील चर्चेमुळे वैयक्तिक मनःस्ताप होण्याची शक्यता वाटते तिथे मी पुनःप्रवेश करीत नाही (असतो एकेकाचा नेमस्त स्वभाव) तरीही 'धनंजय' सारख्या अभ्यासू सदस्यांनी - ज्यांचे लेखन+प्रतिसाद मी अत्यंत उत्सुकतेने वाचत असतो, त्यांच्या अभ्यासाविषयी आदर असल्याने - माझ्याकडून याबाबतीत काही अपेक्षा थेट आपल्या प्रतिसादात व्यक्त केली असल्याने त्याची बूज राखणे मला निकडीचे वाटते म्हणून हे दोन शब्द.
१. दयानंद सरस्वती यांच्या कार्याविषयी आणि विचाराविषयी मला सदैव आदर वाटत आला आहे, विशेषतः "सत्य प्रकाश" वाचल्यानंतर. तुम्ही (पक्षी : धनंजय) वैदिक प्रामाण्य मानणार्‍यापैकी नाही, हरकत नाही. पण म्हणून दयानंद सरस्वती यानी 'अस्पृश्यता मानू नका, सती प्रथा बंद केली पाहिजे, हुंडाबंदी, स्त्रीशिक्षण" आदी विषयी दिलेले संदेश अप्रामाण्य मानू शकणार नाही हे तर तुमचा अभ्यास सांगतोच. मी सावरकरांची शिकवण प्रमाण मानतो, पण गाईविषयींची त्यांची मते मला पचविणे जड जाते. दयानंद सरस्वतींचे त्याबद्दलचे मत मान्य होते. म्हणजेच सामाजिक कार्यातील एखादी व्यक्ती आदरणीय वाटली म्हणून ती जशीच्या तशीच स्वीकारली पाहिजे असेही काही नसते. त्याच न्यायाने स्वामींना 'शंकरा' च्या अस्तित्वाविषयी [बालवयात] आलेली शंका त्यानी प्रमाण मानली आणि जो देव आपले अन्न वाचवू शकत नाही तो देव मर्त्य मानवाला काय सहाय्य करणार, म्हणून जर त्यानी मूर्तीपूजा सोडली असली तरी "इन टोटो" त्यानी "ईश्वर" संकल्पना या देशातून हद्दपार होईल अशी भ्रामक समजूत करून घेतली नव्हती. ज्या ज्या ठिकाणी ते व्याख्यान/प्रवचन्/दिशादिग्दर्शनासाठी जात त्या त्या ठिकाणांचे यजमान त्या काळात (१९ व्या शतकात) देवपूजा - म्हणजेच मूर्तीपूजा करीत असणार हे ओघानेच आले, म्हणजे म्हणून आपल्या शिकवणीविरूद्ध यजमान वागतो या कारणास्तव त्यानी त्याच्याकडील अन्नग्रहण केले नाही असे झाल्याचा दाखला नाही. किंबहुना मूर्तीपूजा करणार्‍या एका यजमानाच्या घरचेच अन्न खावून त्याना विषबाधा झाली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला हा इतिहास आहे.

२. गझनी आदी परकीय आक्रमकांचा 'मूर्ती' ला विरोध आणि स्वामीजींचा विरोध यांची तुलना करणे योग्य नाही. मुस्लिम परकियांना हिंदू धर्मच नेस्तनाबूद करायचा असल्याने त्यानी थेट ज्याची पूजा इथे केली जाते त्या "आयडॉल्स" च्या शस्त्रांनी ठिकर्‍या केल्या, तर स्वामीनी मूर्तीपूजा त्याज्य मानली आणि समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानली असल्याने त्यानी अक्षरशः 'मूर्तीभंजन' केले असे नसून हिंदु धर्मातील "अवतार" पुरुष इथे अवतरले होते ते जगाच्या कल्याणासाठी, स्वत:च्या नावाचा गाजावाजा करण्यासाठी नव्हे हे लोकांनी लक्षात ठेवावे, त्यांच्या शिकवणीला सामोरे जावे, त्यांना मूर्तीत बद्ध करून पूजा करू नये अशी त्यांची शिकवण असे. यात गैर काही नाही. ईश्वराची पूजा करायची आणि त्याची सर्वधर्मसमभाव ही शिकवण मात्र सोयिस्कररित्या 'उच्चनीचते'च्या कल्पनांना बाजूला ठेवायचे म्हणजे देवाच्या नावाने केलेली भक्ती एकप्रकारे दुष्कर्मच होय असे ते मानत. 'मूर्तीपूजा अमान्य होती' केवळ या साम्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती आणि गझनी मंडळी एकाच साच्यातील होतील असे विधान करणे धार्ष्ट्याचे होईल
खूप लिहिता येईल पण इथे ते अप्रस्तुत होईल, म्हणून थेट धाग्यातील विषयाकडे येतो.
३. धागाकर्ते जे कुणी तर्कतीर्थ [उर्फ युयुत्सु उर्फ राजीव उपाध्ये] आहेत; त्यांच्या लेखातील विचारामुळे तुम्हाला थेट स्वामी दयानंद सरस्वती स्मरले याचे मला सखेद आश्चर्य वाटते, धनंजय जी. अर्थात तसे तुम्हाला का वाटले याचे स्पष्टीकरण मागण्याचा मला घटनात्मक असला तरी कोणताही नैतिक अधिकार बिलकुल नाही, कारण तुमचे ते मत वैयक्तिक आहे. पण स्वामींच्या शिकवणीच्या पटलावर श्री.तर्कतीर्थ यांचे याबाबतीतील [मूर्तीपूजा] वर्तन/विचार दुटप्पीपणाच आहेत हे वाचणार्‍याला समजून येईल. त्यानी 'गणपती' ला घरातून हद्दपार का केले आहे ? तर तो 'देव' आहे हे मान्य असले तरी गणपती आमचा [पक्षी : सो कॉल्ड आर्य तर्कतीर्थ यांचा] नसून तो 'अनार्यां' चा असल्याने त्याला जे भजतील ते साहजिकच शूद्र ठरतात. एकीकडे हे गणपतीला बाहेर काढणार [एकदोन पुस्तके वाचून] आणि दुसरीकडे ब्रह्मा-विष्णू-महेश हे बिग बॉस 'आर्य' आहेत म्हणून रात्रदिवस त्यांच्यासमोर काकडआरतीची गाज घालणार. "देवाला माना किंवा मानू नका" यापैकी एक विचारसरणी योग्य, पण देवदेवतात पृथ्वीतलावरील भेदाभेद 'अप्लाय' करणे आणि संस्थळावर तिचे जाहीर प्रकटन करायचे याला जर संस्थळ चालक 'विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती' मानून लेखातील विचार "रोचक" आहे असे म्हणत असतील तर पुढील युक्तीवादाचे दरवाजे बंदच राहणार.


अशोकराव, वर एके ठिकाणी तर्कतीर्थांनी लिहिलं आहे की, 'गणपती हद्दपार झाला, त्यानंतर त्यांच्याकडे आता देवच नाही.' त्यामुळं "ब्रह्मा, विष्णू, महेश" वगैरेपर्यंत विषय जात नाही. तर्कतीर्थांचा तो मुद्दा मांडणीतून सुटू नये. एक प्रकारे ते देवाचं अस्तित्त्व नाकारताहेत का, इथं हा विषय आता गेला पाहिजे. अर्थात, याचा आग्रह नाही. मला चर्चेची ती एक दिशा दिसली इतकेच.
श्रावण जी....
मी तर्कतीर्थांच्या मूळ लेखातील त्यांच्या खालील कबुलींकडे लक्ष वेधू इच्छितो (डार्क ठशातील वाक्य तर्कतीर्थ यांची)
१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची.
// याचा अर्थ त्यांच्य देव्हार्‍यात गणपती तर होतेच, शिवाय ते उच्च दर्जाचे तीन (किंवा त्यापैकी किमान एक) देवही होतेच. त्याचा ते इन्कार करीत नाही.
२. "सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही.
// म्हणजे 'गणपती' नीच आहे हे ठसविण्यासाठी बाकीचे देव उच्च आहेत हे सांगणे याचा अर्थ ते देवाचे अस्तित्व नाकारत तर नाहीतच, उलटपक्षी ते आहेतच पण त्यांची पंगत वेगळी मांडतात हे ओघानेच आले.
३. "हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ. या दोन्ही ग्रंथानी गणेशपूजा त्याज्य मानली आहे."
// ~ ठीक आहे. इथे दाखले अनेक धर्मग्रंथांचे आहेत असे ते म्हणतात म्हणजे लेखक ऋग्वेद मानतात असे मानायला निश्चित जागा आहे. जर ते हा वेद मानतात म्हणजे याच ऋग्वेदात 'विष्णू' या देवतेला पराकाष्ठेचे महत्व आहे. विष्णू आला की क्रमाने 'सूर्या' या शक्तीला मानणे आलेच. सौर वर्षांच्या ३६० दिवसांच्या उल्लेखात ऋतुदर्शक चार नावानी आपल्या दिनदर्शक घोड्यांना विष्णू गती देतो असे म्हटले आहे म्हणजे ती 'देवाची करणी' मानणे आलेच. याचाच अर्थ तर्कतीर्थांच्या मनी आणि वसनी 'विष्णू' ला आर्य मानून वंदन करणे आलेच.
४. "मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे."
~~ हे लेखातील शेवटचे वाक्य. इथे 'सर्व देवदेवताना मी केव्हाच हद्दपार केले आहे' अशी स्पष्टोक्ती असती तर मग त्यांच्या लेखाचा रोख अन्य देवतांकडेही जातो असे म्हटले गेले असते. मात्र फक्त 'गणपती' हेच त्यांचे लक्ष्य आहे. त्याला कारणही तो 'अनार्यां' चा देव आहे असे अनेक पंडितांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांच्या लक्षात आले. तेही तर्कतीर्थांचे बी.ए. पूर्ण झाल्यानंतर तब्बल वीस वर्षानी.

१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो
१. "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची." या माझ्या आईच्या विधानावरून "याचा अर्थ त्यांच्य देव्हार्‍यात गणपती तर होतेच" हा निष्कर्ष कसा काढला गेला हे मला कुणि समजाऊन सांगेल का? वस्तुस्थिती अशी आमच्या देव्हा-यात फक्त ३ देव होते. १ अन्नपूर्णा २ बाळकृष्ण आणि कुलदेवता योगेश्वरी. या सर्वांची कधी कुणि पूजा केल्याचे आठवत नाही. यांची हकालपट्टी झाली देवावरचा विश्वास उडाला तेव्हा.
नंतर गणपती परत काही काळ घरात आला तो केवळ माझ्या कन्येच्या हट्टामुळे. पण त्याची कधी पूजा झालेली नाही.
२. माझी आई गणपतीला विघ्नकर्ता मानत असताना त्याला देव्हा-यात स्थान देईलच कसे. माझी गणेशभक्ती चालायची ती कुणीतरी भेट दिलेल्या गणेश प्रतिमेला घेऊन आणि ही प्रतिमा देव्हा-यात नव्हती तर माझ्या अभ्यासाच्या ठिकाणी होती.
३. " म्हणजे लेखक ऋग्वेद मानतात असे मानायला निश्चित जागा आहे."- हा निष्कर्ष मला अत्यंत हास्यास्पद वाटतो.
४. " मात्र फक्त 'गणपती' हेच त्यांचे लक्ष्य आहे" - गणपतीच्या हद्दपारीचे आणि इतर देवांच्या हद्दपारीची कारणे वेगळी आहेत (आपली निष्कर्ष काढायची पद्धत बघता त्याबद्दल न बोललेले बरे). गणपतीची हद्दपारी त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे झाली. हे परत सांगू इच्छितो.

१. "हा निष्कर्ष कसा काढला गेला हे मला कुणि समजाऊन सांगेल का?"
~ याला उत्तर म्हणजे परत मला तुमच्याच लेखाचा आधार घेतला पाहिजे : (अ) "लहानपणी मी गणपतीभक्त होतो." व (२) "मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे." ~ ही ती दोन वाक्ये. दोन्हीवरून निदान माझातरी (इतरांचा झाला असेल वा नसेल, वा होऊही शकणार नाही) समज असा झाला की, ज्या गणपतीला श्री.तर्कतीर्थ यानी 'आता हद्दपार केले' तो त्यांच्या घरी होताच होता.
३. ऋग्वेदाबाबतचा निष्कर्ष ~ जी व्यक्ती मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांचे दाखले देते, म्हणजे तिने वेदांचा काही प्रमाणावर का होईना अभ्यास केला असणार असे साधे तर्कशास्त्र मी माझ्यापुरते केले. हा निष्कर्ष तुम्हाला हास्यास्पद वाटला असेल तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही. माझी कल्पना तुमच्या वाचन व्यासंगाबद्दलची होती, ती तुम्हालाच मान्य नाही म्हणजे ती हास्यास्पद कशी होईल ?

निष्कर्ष म्हणजे ठोस विधान नसते; ती एक 'प्रॉबॅबिलिटी' असते आणि ती चूक की बरोबर याबाबत ५०-५० वाटणी होऊ शकते.
असो. या विषयावर अधिकची चर्चा न वाढविणे हे उत्तम.
याचा अर्थ तुम्ही सोयीची वाक्ये उचलून सोयीचे निष्कर्ष काढता, असं दिसतंय. कारण अधली मधली वाक्य तुम्हाला गैरसोयीची ठरत होती... असो जाउ दे.
ऋग्वेदाबाबतचा निष्कर्ष - एखादी गोष्ट अभ्यासणे म्हणजे ती मानायलाच हवी का? मी कुराण अभ्यासतो म्हणजे मी कुराण "मानतो" असा अर्थ काढता येईल का?
बाकी तुमच्या "निष्कर्ष म्हणजे ठोस विधान नसते; ती एक 'प्रॉबॅबिलिटी' असते आणि ती चूक की बरोबर याबाबत ५०-५० वाटणी होऊ शकते." या मताबद्दल बाकीच्यांचे काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.
    ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली.
    त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
    अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत.
    त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ. या दोन्ही ग्रंथानी गणेशपूजा त्याज्य मानली आहे. गणपती हा विघ्नकर्ता आहे हे दोन्ही ग्रंथ अधोरेखित करतात.
    मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.
अच्छा. म्हणजे गणपती ही अनार्यदेवता आहे, "ब्राह्मण" (म्हणजे काय, कोण जाणे!) नाही, शूद्र आहे, तसेच मनुस्मृतीने त्याज्य ठरवलेली आहे, म्हणून आपण गणपतीस चाट दिलेली आहे तर.

बरे झाले. निदान या निमित्ताने तरी ज्ञानात भर पडली की देवगणांतही चातुर्वण्य सिस्टिम असल्याचे आमच्यातील कुणी ज्ञानीपंडितांनी नोंदविले आहे. आता उद्या देवघरात स्थापित करण्यासाठी देवासाठींची परसेन्टेजवाईज रीझर्व्हेशन पॉलिसीही (याच संस्थळावर) मिळू शकेल. त्यानुसार छाप विकत घेऊन आणण्याचा विचार सुरू होईल.
" देवदेवतात पृथ्वीतलावरील भेदाभेद 'अप्लाय' करणे " तुम्हाला खटकले हे मी समजू शकतो. पण देव आणि देवतांमध्ये माणसांप्रमाणे भांडणे आहेत हे तुम्हाला माहित नाही असे दिसते. या भांडणांचे काय करायचे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपतीचा बालाजी आणि कोल्हापूरची अंबाबाई. दोघांनी एकमेकांना "सोडून" दिल्याचे ऐकले आहे...
मला सतावणारा खरा प्रश्न वेगळाच आहे. एका शूद्रदेवतेचे गणपतीचे "ब्राहमणिकरण" झाले. ( त्यामूळे त्याला भजणारे शूद्र असा युक्तीवाद मी कधिच करणार नाही).पण लायक शूद्रांच्या ब्राह्मणिकरणात मात्र खंड पडला, त्याचे मात्र वाईट वाटते.
" लायक शूद्राना जानवी वाटा " असे मी ब्राह्मणांना आवर्जून सांगत असतो ...
- तर्कतीर्थ
".....पण देव आणि देवतांमध्ये माणसांप्रमाणे भांडणे आहेत हे तुम्हाला माहित नाही असे दिसते...."
श्री.तर्कतीर्थ
~ फक्त वरील मुद्यापुरते लिहितो. मी वयाने कदाचित तुम्हाला ज्येष्ठ्य आहे. ज्या डॉ.रा.चिं.ढेरे यांच्या पुस्तकाचा तुम्ही आपल्या लेखात उल्लेख केला आहे, ते ढेरे तसेच गाडगीळ आणि तुम्ही ज्या नावाचा आयडी तयार केला आहे ते आद्य 'तर्कतीर्थ' कै. लक्ष्मणशास्त्री जोशी या विषयात ज्याना गुरू मानत त्या अ‍ॅण्ड्र्यू लँग, फ्रेझर, मॅक्सम्यूलर, जॉर्डन अशा प्रकांडपंडितांचे धर्मविषयक साहित्य मी वाचलेले आहे. तुमच्या व्याख्येप्रमाणे जे उच्च देव आहेत आणि ज्याना नीचत्व दिले गेले आहे अशा प्रत्येक देवदेवतांविषयी तसेच दानवांविषयी मी स्वतंत्रपणे लिहू बोलू शकतो, ग्रीक मायथॉलॉजी, ख्रिस्त आणि इस्लाम यांच्याविषयीही मी लिहू/बोलू शकतो, इतकेच नम्रपणे सांगू इच्छितो.

जालावरील लेखनाच्यावेळी आपल्याला दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया येणार हे लेखकाने लेख टाकण्यापूर्वीच गृहित धरणे आवश्यक आहे. लेखाबाबत जे उजव्या बाजूने मत मांडतात त्यांचा अभ्यास थोर आणि जे डावी बाजू पुढे आणतात त्याना/त्यांचा कसलाच अभ्यास नाही असे साध्य मांडणे योग्य नव्हे. आपले काम प्रतिसादकाचा मुद्दा खोडून काढणे आहे, दुसर्‍याचा मुद्दा गैर ठरविताना त्याची कसलीच त्या संदर्भातील साधना नाही असे समजणे गैर आहे.
    >>गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
अलीकडच्या काळात गणपतीचा उलटा प्रवास झाला असे ऐकून आहे:
पेशव्यांच्या गणपतीभक्तीमुळे गणपतीला मराठी ब्राह्मण समाजात प्रतिष्ठा मिळाली. ब्राह्मणेतर समाजात गणपतीची पूजा नसे. त्या काळी महाराष्ट्रात गणपतीला विद्येची म्हणजे ब्राह्मणांची देवता समजले जाऊ लागले. टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला तेव्हा गणपतीचे सार्वत्रिकीकरण केले. म्हणून अनेक ब्राह्मणेतरांकडे गणपती पूजला जाऊ लागला.
हे खरे असेल तर गणपतीने दुसरे वर्तुळ पूर्ण केले (अनार्य किंवा नीच -> ब्राह्मण किंवा उच्च -> सर्वसमावेशक) असेही म्हणता येईल. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

गणेश हा देव नाही किंवा नीच देवता आहे वगैरे मतांशी असहमत. उलट, गणेश हा देव सर्व देवांचा अधिपती आहे, सृष्टीरचैता ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू आणि संहारक महेश यांनी वेळोवेळी श्रीगणेशाची आराधना केली आहे.
परंतु गणेश जन्माविषयीच्या ज्या कथा आहेत उदा. पार्वतीची अंघोळ, ह्त्तीचे शीर वगैरे त्या सगळ्या अयोग्य समजूती (आख्यायिका) आहेत.
गणेशाचे तत्वज्ञान सार्थ रितीने सांगू शकणारे गणेश तत्वज्ञान पंडित म्हणजे गजानन मनोहर पुंडशास्त्री.त्यांनी आपले आयुष्य गणेश चिंतनालाच समर्पित केले. त्यांनी आणि त्यांचे शिष्य प्रा. स्वानंद पुंड यांनी २१ ग्रंथांची "श्री गणेशोपासना ग्रंथमालिका लिहिली. (प्रकाशन : संजना प्रकाशन, मुंबई) या ग्रंथमालिकेत गणेशाविषयीच्या अनेक समजुतींचे अर्थ संदर्भासकट समजतात.
हे २१ ग्रंथ पुढीलप्रमाणे :
१)श्री गणेशोपासना
२)सर्वपूज्य गणराज
३)श्रीगणराज युगावतार
४)श्रीमुद्गल पुराणोक्त अष्टविनायक
५)श्रीसत्यविनायक
६)श्रीगणेश अवतार लीला
७)श्रीगणेशगुरूपरंपरा
८)श्रीगणेश संप्रदाय
९)श्रीगणेश योगींद्राचार्य - यांचे तर गणेशाविषयीचे प्रचंड साहित्य उपलब्ध आहे, त्यांनी श्रीक्षेत्र मोरगावला समाधी घेतली. त्यांची गणेश गीता प्रसिध्द आहे. त्यांनी गणेशाचा अर्थ श्रीगणेश विजय नावाच्या ग्रंथातून स्पष्ट केला आहे
१०)श्री अंकुशधारी योगींद्र
११)श्री मयुरेश्वर क्षेत्रवर्णन
१२)श्री गणेशपुराण उपासना खंड
१३)श्री गणेशपुराण क्रीडा खंड
१४)श्री गणेश गीता
१५)श्री गणेश सहस्त्रनाम
१६) श्रीगणेश अथर्वशीर्ष
१७)संतस्तुत गणराज
१८)गाणपत्य आरती संग्रह
१९) गाणपत्य स्तोत्र संग्रह
२०)गाणपत्य दिनचर्या
२१) गाणपत्य व्रतावली

लेखक :- प्रा. स्वानंद गजानन पुंड
यातील काही ग्रंथ माझ्याकडे आहेत, खालील पत्त्यावर ते नक्कीच उपलब्ध होतील-
संजय वेंगुर्लेकर, संजना प्रकाशन, मीठ बंदर रोड ठाणे पूर्व.

आता यातील माहितीनुसार श्रीगणेश शिवपुत्र नसून परब्रह्म आहे, आणि ओम् कार हेच त्याचे निर्गुण रूप आहे. गणेशाने प्रत्येक युगात अवतार घेतले आहेत. भगवान शंकरासहित अनेक देवतांनी गणेशाची आराधना केल्याचा उल्लेख आहे. आपल्याकडच्या संतांनी सुध्दा गणेशाची स्तुती केली आहे, ती निराकार ओमकार स्वरूप गणेशाची स्तुती आहे, शिवपुत्र गणेशाची नव्हे. "सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी....निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना" इति समर्थ रामदास हे उदाहरण पुरेसे आहे.

माझ्या गणपतीवरील लेखाला सतीश लळीत, जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची खालील प्रतिक्रिया आली -

[...] आपला ब्लॉग प्रथमच पाहिला. आवडला. विषय आणि त्यांची मांडणी छान वाटली. सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन. आत्ता थोडा घाईत आहे. गणपती या तथाकथित वैदिक/आर्य दैवताविषयी दिलेली माहिती अचुक आहे. गाणपत्य संप्रदायाबद्दल असल्याला काही माहिती आहे का? महाराष्ट्रात जे अष्टविनायक नावाचे थोतांड आणि स्तोम आहे, ते सर्व गणपती, म्हणजे मुर्त्या या तंत्र गणपतीच्या आहेत. (तांत्रिक पंथातील)(पण यांच्या मते स्वयंभू). खरेतर जो गणपती आज घरोघर पुजतात, तो आणि हे अष्टविनायक यांचा काहीच संबंध नाही. असो. तुमचा ब्लॉग आता वरचेवर बघत जाईन. शुभेच्छा...

माणसाच्या अंतरंगात अष्टविकार असतात. त्यांना मारणारे ते अष्टविनायक. प्रतिकात्मक अष्टविनायक आपण महाराष्ट्रात मानत असलो तरी अष्टविनायक भारताच्या चहूदिशांना विखूरलेले आहेत. (ज्योतिर्लिंगाप्रमाणे) फक्त मोरगावचा मयुरेश्वर या आठ स्थानांमध्ये येतो.

जर श्री. लळीत यांना त्यांच्या हुद्द्याचा उल्लेख अमान्य नसेल, आणि सदस्य "तर्कतीर्थ" यांनी विनंती केली, तर ऐसी अक्षरे संपादकांनी तो उल्लेख काढून टाकावा.

अर्थात कोणीही कुठल्याही अधिकार्‍याच्या वैयक्तिक मतांबद्दल काहीही लिहू शकतो. अधिकृत घोषणा नसेल, तर खरे-खोटे काहीच नाही. असा कोणी अधिकारी आहे तरी मला कुठे ठाऊक आहे? ललित वाङ्मयात तर खरे-खोटे असा विचार होत नाही. तर ऐसी अक्षरेने संपादन न-केले तरी ललित अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वाखाली आधार आहे.
 
 

शोध गणपतीच्या मूळ रूपाचा

"सुखकर्ता दुःखहर्ता' हे गणपतीचे आजचे रूप. त्याला धर्मशास्त्राने अग्रपूजेचा मान दिलेला आहे. म्हणजे गणपती ही शुभंकर देवता मानण्यात आली आहे. त्याचे हे रूप पाहूनच लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवास सार्वजनिक स्वरूप दिले.

प्रश्‍न असा आहे, की गणपतीचे आजचे हे जे रूप आहे, ते मुळातूनच तसे होते, की शेंदराच्या पुटांप्रमाणे त्याच्यावरही ही "सुखकर्ता दुःखहर्ता'ची पुटे चढविण्यात आली आहेत. दैवतशास्त्रानुसार तरी ते तसेच आहे. म्हणजे हे शास्त्र असे मानते, की गणपती ही देवता यक्षश्रेणीतून उत्क्रांत झाली आहे. यक्ष हे अत्यंत क्रूर असत. माणसांना झपाटणे, त्यांच्या कार्यात विघ्ने आणणे, ती आणू नयेत म्हणून माणसांकडून बली घेणे, माणसांच्या मनात दहशत निर्माण करून त्यांना आपली पूजा करायला लावणे ही या यक्षांची स्वभाववैशिष्ट्ये. त्यांचे रूपही पाहण्यासारखे आहे. सुटलेले पोट, बेडौल शरीर, माणसाचे शरीर आणि प्राण्याचे शीर ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. गणपतीचे रूप असेच क्रूर आणि स्वभाव विघ्नसंतोषी होता. म्हणून तर गणेश, वि-नायक, विघ्नेश, विघ्नविनायक ही त्याची नावे आहेत. त्याने मंगलकार्यात विघ्न आणू नये म्हणून कार्यारंभी त्याची पूजा करून त्याला संतुष्ट करीत. या पूजेला "विनायकशांती' म्हणत.

पुराणांतून गणेशजन्माच्या विविध कथा सांगितलेल्या आहेत. त्या कथा नीट पाहिल्या तर त्यातूनही गणपतीचे अमंगल रूपच स्पष्ट होते. काही कथांत तो पार्वतीच्या शरीराच्या मळापासून झाल्याचे सांगितलेले आहे. काही कथांमध्ये तो पार्वतीच्या मासिक स्त्रावापासून किंवा त्यातून जन्मला आणि म्हणून रक्तवर्ण झाला, असे म्हटलेले आहे.
असा हा गणपती "स्तेनानां पतिः', मूषकराज म्हणजे चोरांचा प्रमुख आहे. दक्षिण भारतात अनेक भागांमध्ये तो जारण-मारण (भूत-भानामती) या क्रियांसाठी पूजला जातो.

गणपतीची आणखीही एक गंमत आहे. आपण मंगळ हा क्रूर ग्रह मानतो. तो पृथ्वीचा पुत्र आहे असेही मानतो. मंगळाचा रंगही लाल आहे. आता पृथ्वी आणि पार्वती एकरूप आहे. म्हणूनच गणेश आणि मंगल यांचा संबंध आहे. कसा, तर दोघेही पृथ्वी म्हणजेच पार्वतीचे पुत्र. आता गणपतीच्या पूजेत, उपासनेत मंगळवारचे एवढे महत्त्व का ते आले ना लक्षात? मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिका किंवा अंगारकी चतुर्थी म्हणतात. अंगारक म्हणजेच मंगळ. या सर्व गोष्टी गणपतीच्या क्रूर रूपाकडेच निर्देश करणाऱ्या आहेत.

तर गणपती मूळचा असा असताना त्याला आजचे सोज्वळ रूप कसे प्राप्त झाले? याचे असे उत्तर देण्यात येते, की भीतीच्या भावनेतून ईश्‍वरपूजन केले जावे हे समाजधुरीण आणि संतमंडळींना मान्य नव्हते. पण लोकांच्या मनावर या क्रूर देवतांचा जो प्रभाव होता तोही त्यांना दूर करता येत नव्हता. मग त्यांनी काय केले, तर या क्रूर देवतांचे उन्नयन केले. त्यातून गणपतीला आजचे हे "सुखकर्ता-दुःखहर्ता' रूप प्राप्त झाले.


(संदर्भ ः अ. द. मराठे यांचा लेख, मैफल पुरवणी, महाराष्ट्र टाइम्स, 15 सप्टें. 1996) 
 
http://khattamitha.blogspot.com/2008/01/blog-post_08.html
 

गणेश विशेष : ललाटिबब ते गणेशपट्टी

Written by लोकप्रभा टीम

एखादे मंदिर हे कुठल्या संप्रदायाचे आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट मूर्तीची निर्मिती विशिष्ट ठिकाणी केली जाऊ लागली.

आशुतोष बापट response.lokprabha@expressindia.com

देवा तूंचि गणेशु, सकळ मति प्रकाशु

म्हणे निवृत्ती दासु अवधारिजो जी

वक्रतुंड, लंबोदर, गणाधिपती अशा विविध नावांनी अत्यंत लोकप्रिय असलेल्या गणपतीला ज्ञानदेवांनी असे आवाहन केले आहे. त्याचे सुखकर्ता, विघ्नहर्ता हे स्वरूप आणि त्याचे मनामनांत असलेले स्थान पाहता कुठलीही गोष्ट सुरू करताना तिथे सर्वात आधी गणपतीची पूजा करणे हे आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य अंग झालेले आहे. वेद, उपनिषदे, महाकाव्ये यांच्या काळात फारशी माहिती नसलेली ही देवता तुलनेने काहीशी उशिरा देवता संप्रदायात समाविष्ट झाली आणि सर्वात जास्त लोकप्रियसुद्धा हीच देवता झाली. या देवतेच्या प्राचीन अस्तित्वाचे तुटक तुटक संदर्भ साहित्यातून सापडतात. तरीही ही देवता तशी नंतरच्या काळात प्रकट झालेली दिसते; परंतु असे असले तरीही, लोकप्रियतेच्या बाबतीत इतर कुठल्याही देवतेपेक्षा गणपती हा सर्वाधिक लोकप्रिय देव आहे. त्यामुळेच की काय, ‘बाप्पा’ हे प्रेमळ नामाभिधान फक्त याच देवाला प्राप्त झालेले दिसते.

कुठल्याही कामाची सुरुवात गणेशाच्याच नमनाने होते. ‘निर्विघ्नं कुरुमे देव, सर्वकार्येषु सर्वदा’ या भावनेने गणरायाला सर्वात प्रथम पुजले जाते. यामागे गणपती ही विघ्नांची अधिपती देवता आहे, तिचे पूजन केल्यावर विघ्ने आसपाससुद्धा फिरकणार नाहीत असा विश्वास असल्यामुळे, गणपतीचे पूजन सुरू झाल्याचे अभ्यासक सांगतात. नंतर ही देवता विघ्नहर्ता म्हणूनच पुजली जाऊ लागली. संकटांचे निर्दालन करणारी देवता असल्यामुळे कुठल्याही कार्याच्या सुरुवातीलाच

या देवतेला आवाहन करून तिची प्रतिष्ठापना कार्याच्या ठिकाणी करायची, म्हणजे कुठलेही विघ्न जरी आले, तरी त्याचे आपोआप निर्दालन होईल, अशी सर्वाची श्रद्धा.

आपल्याकडे गुप्तकाळानंतर हळूहळू मंदिरस्थापत्य मोठय़ा प्रमाणावर विकसित होऊ लागले. भारतात शैव, वैष्णव, शक्ती असे विविध पंथ-उपपंथ अस्तित्वात होते. त्यांच्या उपास्य देवतांची मंदिरे बांधली जाऊ लागली. मंदिरे कशी बांधायची, त्यांचे स्वरूप कसे असेल, त्या मंदिरावर कुठल्या मूर्ती आणि त्या कुठल्या ठिकाणी असायला पाहिजेत याचे एक विशिष्ट शास्त्र विकसित होत गेले. मूर्तिकला आणि मंदिरस्थापत्य हे हातात हात घालूनच विकसित होत गेल्याचे दिसते. मूर्ती, मंदिरे यांच्या निर्मितीसाठी विविध शास्त्रीय ग्रंथ निर्माण झाले आणि त्यांतून एक ठरावीक शास्त्रोक्त पद्धती सांगितली गेली. मंदिरस्थापत्यात काही विशिष्ट गोष्टी प्रामुख्याने निर्माण होत गेल्या. गर्भगृहाचे दरवाजे हे विशिष्ट द्वारशाखांनी सजवले जाऊ लागले. त्या द्वारशाखांच्या संख्येवरून त्यांना नेमकी नावे दिली जाऊ लागली. एखादे मंदिर हे कुठल्या संप्रदायाचे आहे हे समजण्यासाठी काही विशिष्ट मूर्तीची निर्मिती विशिष्ट ठिकाणी केली जाऊ लागली.

द्वारशाखेच्या डोक्यावर मध्यभागी एक चौकट करून त्यात त्या संप्रदायाच्या देवतेची मूर्ती कोरली जाऊ लागली. त्यावरून अमुक एक मंदिर हे अमुक एका देवता संप्रदायाचे आहे, हे समजायला मदत होत असे. द्वारशाखेच्या डोक्यावरील जागा म्हणजे ‘ललाटावरची’ जागा आणि त्या ठिकाणी असलेली मूर्ती म्हणजे बिंब यावरून त्या ठिकाणाला ‘ललाटबिंब’ असे म्हणले जाऊ लागले. मग विष्णूचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गरुड दिसतो. देवीचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून क्वचित देवी किंवा कधी कधी गजलक्ष्मी दिसते. तर महादेवाचे मंदिर असले तर, ललाटबिंब म्हणून गणपती असतो; परंतु दक्षिण भारतात गेलो तर, अनेक ठिकाणी मंदिर कुणाचेही असले तरीही ललाटबिंबावर गजलक्ष्मीचेच शिल्प पाहायला मिळते. अनेकदा मंदिरातील मूळ मूर्ती परकीय आक्रमणात भग्न झाल्यामुळे किंवा तिथून हलवली गेल्यामुळे गाभारा काही काळ मोकळाच असतो. मात्र कालांतराने त्यात शिवपिंडीची स्थापना केल्याचे दिसून येते. अशा वेळी ललाटबिंबावरून मूळ मंदिर कुणाचे असावे, याचा अंदाज बांधता येतो.

महाराष्ट्रात मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे. गणपती ही देवता इथे लोकप्रिय होत गेली. तसेच गाणपत्य संप्रदायाचा विकास महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यामुळे गणपती या देवतेबद्दल कमालीची श्रद्धा आपल्याकडे दिसून येते. सगळ्या गोष्टींचा कर्ता करविता हा प्रत्यक्ष गजाननच आहे, ही भावना आणि श्रद्धा महाराष्ट्रात फार खोलवर रुजलेली आहे. निरनिराळ्या रूपांत तो भक्तांना दर्शन देत असतो. त्याची नावे आणि रूपे वेगवेगळी असली तरी भक्तांचे रक्षण, हेच त्याचे मोठे कार्य. मग तो कुठल्या रूपात आहे यापेक्षाही तो आपल्या जवळ आहे याची जाणीव भक्तांना जास्त सुखावह असते आणि म्हणूनच आरतीत म्हटल्याप्रमाणे ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’ अशी अवस्था भक्तांची होते. एका क्षणमात्र दर्शनाने सगळा थकवा, शीण, नैराश्य पळून जाते. इतर कुठल्याही देवांपेक्षा गणपती हा प्रत्येकाला आपला सखा वाटतो, जवळचा मित्र वाटतो. म्हणूनच त्याला ‘त्वं ब्रह्मा, त्वं विष्णु:, त्वम् अग्नी, त्वम् इंद्र’, असे म्हटले आहे. हे सगळे देव किंवा ती तत्त्वे या एकाच देवतेमध्ये सामावलेली आहेत, अशी भक्तांची पक्की धारणा आहे. ‘ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान’ असे तुकोबारायांनी गणेशाबद्दल म्हटले आहे.

या सगळ्या गोष्टींचा मंदिरस्थापत्यावरसुद्धा प्रभाव पडला आणि महाराष्ट्रात मंदिर कुणाचेही असो, परंतु काही अपवाद वगळता ललाटबिंबावर गणपतीचेच शिल्पांकन केले जाऊ लागले. मुख्यत्वे यादव साम्राज्याच्या विकासाच्या काळात जी काही मंदिरे महाराष्ट्रात बांधली गेली, त्यांच्या ललाटबिंबावर गणपतीच विराजमान झालेला दिसतो. खरे तर भारतभर इथे विविध देवतांचे अंकन बघायला मिळत असले, तरीही महाराष्ट्रात केवळ गणपतीच दिसत असल्यामुळे पुढे पुढे या स्थानाला ‘गणेशपट्टी’ हेच नाव प्राप्त झाले. ललाटबिंब हे नाव मागे पडून गणेशपट्टी हे नाव महाराष्ट्रात सर्वत्र रूढ झाले. इथे चार हातांचा गणपती एका हाताने अभय देताना दाखवलेला असतो. गणपतीचे विघ्नहर्ता हे रूप याला कारणीभूत असले, तरी पुढेपुढे गणेशाप्रति असलेली अपार श्रद्धा प्रबळ झाली. आता गणपती हे मांगल्याचे प्रतीक झालेले दिसते. जे जे उत्कट, उदात्त, उन्नत ते सर्व गणपतीच्या ठायी एकवटलेले आहे, अशी भक्तांची श्रद्धा! गणपतीचे हेच मंगलरूप त्यानंतर पुढे मोठमोठय़ा वाडय़ांवरसुद्धा दिसून येते. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात गेल्यावर जिथे जुने वाडे असतात, तिथे दरवाजावरील कोनाडय़ात गणेशाचे शिल्प हटकून दिसतेच. या मोठय़ा वाडय़ांच्या दरवाजावर गणपती बाप्पा विराजमान झाला. त्यानंतर साहजिकच घरांच्या दरवाजावरसुद्धा गणपतीचेच अंकन दिसते. यामागे भक्तांच्या दोन प्रकारच्या भावना असू शकतात. एक म्हणजे तो विघ्नहर्ता आहे, त्यामुळे घराच्या दारावर बाहेरच्या बाजूला देवाचे अंकन केलेले असेल तर कुठलेही विघ्न घरात प्रवेश करूच शकणार नाही, ही एक भावना. तर दुसरी भावना म्हणजे गणपती हे मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे आपल्या वास्तूच्या मधोमध आणि उच्च ठिकाणी या मांगल्याची प्रतिमा असायला हवी, ही एक भावना.

किल्ले म्हणजे त्या त्या राजवटीच्या सामर्थ्यांचे प्रतीक! संरक्षणाचे मोठे काम या किल्लय़ांकडे होते. त्यांच्या दरवाजावरसुद्धा आपल्याला गणपतीच दिसून येतील. कधी दरवाजावर, तर कधी प्रवेश करताना बाजूच्या कोनाडय़ात गणेशाचे शिल्पांकन हटकून दिसते. शिवरायांचा देखणा किल्ला राजगड, याच्या सुवेळा माचीवरसुद्धा आपल्याला गणपती विराजमान झालेला दिसतो. म्हणजेच संरक्षण, सामथ्र्य, मांगल्य अशा प्रत्येक वेळी आपल्याला गणेशाचीच मूर्ती बघायला मिळते. जुन्नरजवळ असलेल्या किल्ले चावंडवर एकमेकाला जोडलेली पाण्याची सात टाकी आहेत. त्यातल्या एका टाक्यात उतरायला पायऱ्या आणि पुढे खडकात कोरलेला दरवाजा केलेला आहे. या दरवाजावरसुद्धा एका सुंदर चौकटीमध्ये गजाननाचे शिल्पांकन केलेले आढळते. यावरून त्या टाक्यांपैकी हे एकच टाके काहीसे वेगळे आहे आणि याचे पवित्र जल कदाचित किल्लय़ावरील मंदिरातल्या देवतेच्या अभिषेकाला वापरत असावेत. मांगल्याची ही खूण इथे अशी गणेशाच्या शिल्पांकनातून दिसते.

पुढे पेशवाईतसुद्धा मंदिरांच्या ललाटावर सर्वत्र गणपतीच पाहायला मिळतो. कोकणात या काळात लहानमोठी बरीच मंदिरे बांधली गेली. कोकणातली मंदिरे ही खास तिथल्या हवामानाला आणि पर्जन्यमानाला अनुकूल अशी असतात. म्हणजे मंदिराला उतरते कौलारू छत असते; परंतु कोकणातल्या अनेक मंदिरांमध्ये सभामंडपावर लाकडी कलाकुसर केलेली दिसते. या लाकडी कलाकुसरीची प्रवेशद्वारे आजही गणेशपट्टीने सजवलेली दिसतात. मुख्य गाभारा दगडी असेल तर त्यावर गणपती असतोच; परंतु त्यापुढचा सभामंडप लाकडी असेल तर त्याच्या चौकटीवरसुद्धा गणपतीचे देखणे शिल्पांकन असते. या सुंदर सजवलेल्या चौकटी आजही आपल्याला कोकणातल्या देवळांत दिसतात. मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणपतीचे गणेशपट्टीवरील स्थान हे आता अबाधित आहे. काळ बदलला, वास्तू बदलल्या तरीसुद्धा गणपती आणि त्याच्या प्रति असलेली श्रद्धा अजूनही तितकीच दृढ असलेली दिसते. आजही नवीन वास्तूचा दरवाजा, मग तो नवीन पद्धतीच्या सदनिकेचा दरवाजा जरी असला तरीही त्यावर आपल्याला गणपतीचे चित्र असलेलीच फरशी बसवलेली दिसते.

विघ्नहर्ता देव ते मांगल्याचे प्रतीक असा या देवाचा प्रवास फार सुंदर आहे. तो आपल्याला विविध मंदिरांवरील गणेशपट्टीच्या रूपाने आजही बघता येतो. नवीन कार्य आणि गणपती यांचा संबंध इतका दृढ झाला आहे, की कुठल्याही कार्याची सुरुवात करताना त्या कार्याचा ‘श्रीगणेशा’ झाला असा शब्द रूढ झालेला दिसतो. कुठल्याही वास्तूच्या गणेशपट्टीवरील देवाचे हे स्थान अढळ आहे. सुखकर्ता दु:खहर्ता स्वरूपात गणेशाचा अभयहस्त भक्तांवर कायम आहे.


कामशिल्पे

 रॉय किणीकर


कामव्यवहारासंबंधीचा अंक भारतातील प्रसिद्ध शिल्पकलांतील कामव्यवहार व संभोगशिल्पांसंबंधीच्या लेखनाशिवाय अपुरा राहिला असता. रॉय किणीकर यांच्या 'शिल्पायन' या अनिल किणीकर संपादित लेखसंग्रहातील 'कामशिल्पे’ हा लेख आपल्या अंकाच्या विषयाला साजेसा वाटला. श्री अनिल किणीकरांना या लेखातील काही अंश या अंकात पुनर्प्रकाशित करायची अनुमती विचारली असता त्यांनी ती त्वरित दिली. सदर पुस्तक (शिल्पायन) हे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. 'कामशिल्प' हा प्रदीर्घ लेख जसाच्या तसा इथे न देता अंकाच्या विषयाला धरून त्यातील काही अंशांचे इथे पुनर्प्रकाशन करत आहोत. संपादक आणि प्रकाशक या दोघांचेही विशेष आभार.

---

जगन्नाथपुरीच्या ईशान्येस सुमारे २० मैलांवर कोनॉर्क अथवा कोनार्क किंवा कर्णार्क नावाचे सूर्यमंदिर उभे आहे. भारताच्या पूर्व सागरकिनारी. एकाकी. उद्ध्वस्त. नि:शब्द. गंभीर. जणू काय त्या मंदिराला कालातीत अशी क्वचित समाधीच लागली आहे! कोठूनतरी लांबवरून सागरलाटांचा खळखळाट कानावर आला न आला, इतपतच. जांभळ्या-काळ्या दगडांची ती वास्तू आहे.

आज तुम्ही तिथे गेलात, तर तिथल्या निरामय शांततेचा भंग झालेला आढळणार नाही. यात्रिकाच्या अथवा साधकाच्या तोंडून एखादे सूर्य-स्तोत्र अथवा उषेचे स्तोत्र ओठातल्या ओठात का होईना, निघालेले तुमच्या कानावर येणार नाही. असली ही अद्भुतरम्य आणि भावगर्भ दाट प्रशांतता मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. माझ्या डोळ्यांपुढे या सूर्यमंदिराचे वेगळे तरळते स्वप्नरम्य चित्र होते. आणि मी तिथे पोहोचलो, ते पाहिले आणि ते स्वप्नमय चित्र डोळ्यांतील आसवांनी हळूहळू पुसले गेले, भिजले, वाळले आणि नाहीसे झाले!

ते सूर्यमंदिर आज तिथे उभे आहे. एखादा वठराज खूप वर्षांची तपसाधना केल्यानंतर वठून जावा, तसे त्याचे रूप मला दिसले; पण त्या रूपातही दिव्यसौंदर्याची बीजे, शलाका मला हळूहळू आढळल्या आणि ज्या काळात ते अवाढव्य अप्रतिम शिल्पकाव्य बांधले गेले, तो काळ मला आठवला!

इसवी सनाच्या तेराव्या शतकात कलिंग राजघराण्यातील नरसिंह देव (पहिला) या राजाने ते बांधले. आज तिथल्या त्या भव्य प्राचीन मंदिराचे पाहण्यासारखे अवशेष उरलेले आहेत, ते फक्त 'जगमोहन'च्या सभामंडपाचे. सम्राट अकबराच्या कारकिर्दीत अबुल फजल अलुमी या अखबारविसाने जी काही टिपणे लिहून ठेवलेली आहेत, तेवढ्यावरूनही आपल्याला त्या मूळ भव्य वास्तूची कल्पना करायला मिळते.

इसवी सन १२५० ते १२६२पर्यंत सुमारे १२ वर्षे या मंदिराचे बांधकाम आणि शिल्पकाम चालले होते. सुमारे १२ हजार वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य विशारद, पारथरवट, कलाकार आणि शिल्पकार हे मंदिर घडवण्यासाठी राबत होते. सुमारे ३६ निखर्व सुवर्णमुद्रा हे मंदिर घडवण्यासाठी खर्च केल्या गेल्या.

पण अशा निर्जन आडवाटेच्या एकान्तात हे असे सूर्यमंदिर का घडवले गेले असावे? इतिहासकारांनी आणि शिल्पशास्त्रज्ञांनी यावर खूप भाष्ये लिहिली आहेत; पण ती सर्व भाष्ये वाचूनदेखील मनाचे समाधान होत नाही.

---

कोनार्कचे सूर्यमंदिर पाहताना दोन मुद्दे प्रामुख्याने डोळ्यांपुढे उभे राहतात. पहिला म्हणजे - भारतात एकमेव असे हे (गुजरातेतील छोटेसे मोधुरा सूर्यमंदिर वगळल्यास) सूर्यमंदिर आहे. त्या काळात सूर्योपासना इतरत्र होत नव्हती का? आणि दुसरा - हे जे सूर्यमंदिर बांधले गेले, त्या मंदिरावर कामशिल्पांची जी आरास दिसून येते; त्यामागचा उद्देश, ध्येय अथवा इतिहास काय असावा?

पहिल्या प्रश्नाचे उत्तर उत्कल प्रदेशातील एका लोककथेतून मला ऐकायला मिळाले. राजा नरसिंह-नृसिंहदेव हा सूर्यपूत्र कर्णाच्या वंशातला, अनौरस. कुलदेवतेवरची निष्ठा त्याने सूर्यमंदिर बांधून व्यक्त केली. परंतु त्या मंदिराच्या शिखरावर जी कामशिल्पे बसविली गेली, ती बसवताना नृसिंहाच्या मनात कसलातरी विकृत हेतू असावा की काय? उत्कल प्रदेशातील कथा सांगते, की कुंतीला नियोग पद्धतीने कर्णाची प्राप्ती झाली आणि तीही कौमार्यावस्थेत. त्यामुळे कर्णाला जाहीर रीतीने कुंतीने आपला पुत्र मानले नाही. त्याच वंशातला हा आपला नृसिंह देव (तेराव्या शतकातला). स्त्री-पुरुषांचा संभोग किती पवित्र, किती उदात्त, किती मांगल्याने भरलेला आहे आणि संभोगातून मिळणारी कामतृप्ती हीच जगातील एक सृजनशील अधिशक्ती आहे, तिच्यातच उत्पत्ती, स्थिती आणि लय यांची बीजे साठवलेली आहेत; असे लोककथाकार सांगतो. कामवासना असणे वाईट नव्हे, ती अहितकारक नव्हे, त्यात समाजघातक नाही, असे कामशास्त्रज्ञ वात्स्यायनही म्हणतो. लिंगपूजा ही तर भारताची प्राचीनतम संस्कृती होती आणि अजून आहे.

ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही तीन दैवते जन्म, प्रगती आणि मृत्यू यांना वाहिलेली. शंकराचे प्रतीक म्हणजे शिवलिंग. सारांश - मृत्यूचे, संहाराचे, विलयाचे महान स्वरूप म्हणजे शंकर! आणि त्या शंकराची प्रतिमा आपण प्रतीकात्मक स्वरूपात जी घेतली, ती म्हणजे शाळुंका आणि मधोमध असलेले लिंग. योनी-लिंगाचे ते स्पष्ट स्वरूप आहे. जगाची उत्पत्ती व्हावी म्हणून जी दोन इंद्रिये वापरली जातात, ती ही! योनी आणि लिंग म्हणजे जन्माचे प्रतीक आणि ते वाहिले कुणाला? तर मृत्यूला! मृत्युदेवतेला! शंकराला! त्यातून पुन्हा या शाळुंकेतून निघालेल्या लिंगाचा सूक्ष्म दृष्टीने अभ्यास केला, तर पाहा कसे एक चमत्कारिक आणि अद्भुतरम्य चित्र उभे राहते! शाळुंका जी आहे, ती स्त्रियांची योनीजिव्हा (vagina). योनीमुखात लिंग गेले तर ते आत जाईल, असे बाहेर येणार नाही. शाळुंकेला ज्या वक्राकार वळकट्या आहेत त्या (valva) आंतर-योनीच्या! त्याचाच अर्थ योनिगर्भात शिरलेले ते स्थूल लिंग आहे. सारांश, Time and space quantum ला छेद देणारे, कालगर्भाच्या अमृतत्त्वाला स्पर्श करणारे हे महालिंग आहे!

प्राचीन काळातील प्रचंड, भव्य, उदात्त आणि मानवी संस्कृतीच्या इतिहासात घडवले गेलेले हे कामदर्शन आहे! यात काव्य आहे, यात तत्त्वज्ञान आहे, यात प्रपंचही आहे आणि परमार्थही आहे!

खजुराहो घ्या, भुवनेश्वर घ्या, भारतात हजारो अशी मंदिरे किंवा लेणी सापडतील, की ज्याच्यावर कोठे ना कोठे तरी कामशिल्पाची एखादी रेघ ओढलेलीच असणार!

---

ज्या काळात कोनार्क, खजुराहो इत्यादी प्राचीन मंदिरे बांधली गेली, तो काळ डोळ्यांपुढे आला म्हणजे वाटू लागते; त्या काळातील समाज सधन होता, सुखवस्तू होता आणि सुसंस्कृतही होता. त्याआधी बांधल्या गेलेल्या देवालयांचे अवशेष पाहिले आणि त्यांची कामशिल्पाने विभूषित अशी कोनार्क आणि खजुराहोसारखी मंदिरे पाहिली म्हणजे निश्चितपणे वाटते, की समाजजीवन उत्क्रांत होत चालले होते. समाजाच्या मनात ‘फ्लेश’विषयीचा (flesh) कसल्याही तर्‍हेचा कॉम्प्लेक्स नव्हता. समाज धीट होता. पुष्ट होता. संतुष्ट होता. जी आज आपण चोरून, काळ्या बाजारातील मैथुनचित्रे विकत घेऊन पाहतो; तीच चित्रे कोनार्क आणि खजुराहोच्या शिल्पकारांनी जणू 'ओपन सेक्स आर्ट गॅलरी’त उघड्यावर मांडलेली होती. यांचे कारण एकच. आज आम्ही वैज्ञानिकदृष्ट्या कितीही पुढे गेलेलो असलो, तरी मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या आज आपण तसे परावर्तित अवस्थेतच आहोत.

देहधर्माविषयी आणि मैथुनकर्माविषयी त्या काळातील लोकांत घृणा नव्हती. परिचय, प्रीती, सहवास, आलिंगन, संभोग या सर्व क्रिया देहाला आणि मनाला भूषविणार्‍या आहेत, समृद्ध करणार्‍या आहेत असे त्यांना वाटत असावे.

शिवलिंगाचे प्रतीक आणि त्या प्रतीकाची पूजा हे त्याच सामाजिक आणि मानसिक अभिनिवेशाचे दर्शक नव्हते काय? स्त्री-पुरुषातील संबंध आणि त्या संबंधातून अभिव्यक्त होणार्‍या शरीराच्या कलात्मक आकृती या अतिशय सुंदर, पवित्र आणि उदात्त आहेत, अशी तत्कालीन समाजधारणा असावी.

कोनार्क आणि खजुराहो येथील मैथुनशिल्पे पाहिल्यानंतर आणि त्या मैथुनशिल्पांतील उच्च कोटीची कलात्मकता अनुभवल्यानंतर पाहणार्‍याच्या मनामध्ये हीन पातळीची कामोत्तेजक भावना निर्माण होणे शक्य नाही. कोनार्कच्या देवालयावरची संभोग-आसनांचे आकृतिबंध हे प्लास्टिक आर्टमधल्या उच्च आणि उदात्त अभिरुचीचे दर्शन घडवणारे आहेत.

---

रॉय किणीकर कामशिल्प

आर्ट लाइज इन कन्सिलिंग आर्ट (Art lies in concealing art) असे प्रबोधन या मैथुनशिल्पातून हटकून होते, असे मी म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. या मैथुनशिल्पांतला निर्मळपणा खरोखर दृष्ट लागण्यासारखा आहे. ती मैथुनशिल्पे पाहिल्यानंतर मन एका सृजनशील स्वर्गीय वातावरणात विहार करू लागते. गर्भसंभवाच्या आणि गर्भपोषणकाळातील ही स्त्री-पुरुषांची शृंगारिक चित्तचित्रे आहेत. ज्या देहधर्माच्या पार्थिव वासनेतून जीवनाचा वेल अंकुरतो आणि गगनाच्या मांडवावर तो वर चढत जातो; त्याला अश्लील, बीभत्स (vulgar, obscene अथवा pornographic) म्हणण्यातून आम्ही किती ढोंगी आहोत, किती जीर्ण आणि बुरसटलेल्या मनाचे आहोत, किती असंस्कृत आणि किती कलाद्रोही आहोत, हेच तर सिद्ध होत नाही काय? काही टीकाकार म्हणतात, की त्या प्राचीन मंदिरावरील मैथुनचित्रे पाहिल्यानंतर यात्रिकाच्या किंवा भाविकाच्या मनात शृंगार आणि कामचेष्टितांविषयी घृणा निर्माण होते; देहात भरून राहिलेल्या वासनेवर तो थुंकतो आणि एका उदात्त मनाच्या अवस्थेत देवालयात देवदर्शन घेण्यासाठी प्रवेश करतो. सब्लिमेशन ऑफ इमोशन्स (Sublimation of emotions) किंवा कॅथार्सिस (Catharsis) असेही नाव टीकाकारांनी या भावनास्पंदनाला दिलेले आहे; पण हे सर्व आपल्याला पटत नाही.

तो काळ असा होता, की जेव्हा मोक्षधर्माविषयी समाजाला ओढ होती. प्रपंच अथवा संसार क्षणभंगुर आहे, हा देह विटाळाचा गोळा आहे, या विषयासक्त देहावर प्रेम करणे पाप आहे, प्रपंच आणि संसार सोडून आणि अंगाला राख फासून रानावनात जावे, चिंतन करावे अशा तर्‍हेची समाजविघातक विचारप्रणाली त्या काळात फोफावत होती. पत्नीच्या गालावरील गुलाबी रंगापेक्षा छाटीचा भगवा रंग अत्यंत श्रेष्ठ आहे, मोलाचा आहे, अशा खुळ्या विचाराने त्या काळातील समाजजीवनाला घेरले-वेढले होते. जन्म, शैशव, कौमार्य, तारुण्य, शेवटी वार्धक्य व पुढे मृत्यू हे चित्र काढताना त्यांच्यापुढे कातड्याच्या पिशवीत शिवून काढलेला सांगाडा म्हणजे एक देह, असे चित्र सदैव तरंगत होते.

---

देह ही छाया आहे. संसार ही माया आहे. स्त्री-पुरुषातील प्रपंचे हे नाटक आहे. देहात्मक वासना या मायिक आहेत आणि सनातन सत्य, शिव आणि सुंदर फक्त तो आत्मा आहे. अशा तर्‍हेच्या तत्त्वज्ञानाभोवती समाज प्रदक्षिणा घालत होता, मनाला भोवळ येईपर्यंत प्रदक्षिणा घालत होता आणि अस्तित्वातच नसलेल्या शून्याचा आधार घेऊन जीवनाचे आणि विश्वाचे गणित सोडवू पाहत होता.

शंकराचार्यांची इथेच फसगत झाली. गौतम बुद्धांची इथेच फसगत झाली. एवढेच नव्हे, तर जगातील मोठमोठे धर्मप्रेषित येशू ख्रिस्त, पैगंबर महमंद, झरतुष्ट्र आणि अशांसारख्यांचीही हीच फसगत झाली. हे सर्व तत्त्ववेत्ते, धर्मद्रष्टे, अमावस्येच्या रात्री, काळोख्या खोलीत, अजिबात अस्तित्वात नसलेल्या काळ्या मांजराचा आंधळ्या हातांनी आणि डोळ्यांनी शोध घेत होते.

अशा प्रपंचविन्मुख करणार्‍या रिअ‍ॅक्शनरी तत्त्वज्ञानाच्या चिखलात रुतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी खजुराहो, कोनार्क वगैरे मंदिरांवरील मैथुनशिल्पे क्रांतिकारक शिल्पकारांनी घडविलेली असावीत, असे माझे निश्चित मत आहे.

---

अभिजात कला धीट असते. ती जीर्ण जर्जर संस्कृतीला कृतनिश्चयाने सामोरी जाते. अशा वेळी रतिक्रीडेतील वस्त्रे आपोआप गळावीत, आभरणे बाजूला व्हावीत, नग्नतेचा आडपडदा पारदर्शक व्हावा... यात नवल ते काय!

चुंबन घेणे, आलिंगन देणे अथवा संभोग घेणे याची नग्न चित्रे रेखाटणार्‍या कलाकारांना नावे ठेवणार्‍या समाजाची आणि टीकाकारांची खरोखर कीव येते; परंतु नग्नतेविषयी, मैथुनक्रीडेविषयी अशा तर्‍हेची भावना का निर्माण व्हावी? याचा आपण शोध घेतल्यास असे दिसते, की क्लासिकल म्युझिक समजण्यासाठी जसे तुमचे कान 'ट्रेन' व्हावे लागतात, उंची मद्य घेण्यासाठी जशी तुमची 'टेस्ट' ट्रेन व्हावी लागते, कथकली-मणिपुरी अथवा भरतनाट्यम् नृत्य पाहताना त्यातले सौंदर्य कळण्यासाठी जशी तुमची दृष्टी ट्रेन व्हावी लागते; त्याप्रमाणे कोनार्क व खजुराहो येथील प्राचीन मंदिरांवरील मैथुनशिल्पे पाहताना तुमचे मन, तुमची अभिरुची, तुमची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी जर 'ट्रेन्ड', सुसंस्कृत आणि विदग्ध नसेल - तर त्या मैथुनशिल्पातील अप्रतिम सौंदर्य तुम्हांला दिसणार नाही. तुम्हांला त्यातील अश्लीलता आणि बीभत्सता तेवढी दिसेल.

खजुराहो व कोनार्क येथील मैथुनशिल्पांत आढळणार्‍या शिल्पबंधांचा अभ्यास आज खरोखर गंभीरपणे व्हायला हवा. कामक्रीडेतील आलिंगन, बंधन, चुंबन, आरोहण, बाहुकस, अधररसकोष, नैत्रालिंगन, मुखलिंगन या सर्वांच्या आकृतिबंधातून दिसणारी परम्युटेशन्स अ‍ॅन्ड कॉम्बिनेशन्स पाहिल्यानंतर तुम्ही खरे प्रामाणिक असाल तर म्हणाल, ते शिल्पकार सेडिस्ट नव्हते, मासोकिस्ट नव्हते, लेस्बियन नव्हते, परव्हर्ट नव्हते, मॉर्बिड नव्हते. कामकुंडात केवळ वीर्याहुती देणार्‍या आजच्या संभावित आणि शिष्ट ऋत्विजांना आणि आचार्यांना त्या मैथुनशिल्पांत अश्लीलतेचा गंध आढळणारच! खरोखर मैथुनशिल्पन्यासातील अंगोपांगाचा विचार केला, तर असे वाटते, की कुणीतरी आजच्या नव्या शिल्पप्रवर्तकाने ही शिल्पमीमांसा करावी. छिन्नीच्या आघाताखाली वाकणार्‍या पाषाणाला मानवाच्या मानसिक विकृतीचा तेव्हा स्पर्शही झाला नसावा. हा पाषाण खरोखर अव्यभिचारी, अंतःप्रेरणेने विशुद्ध आणि शिल्पसौष्ठवाने पुरेपूर भरलेला दिसतो. या पाषाणावर वशीकरणाचे अथर्ववेद लिहिले गेले नव्हते नव्हते, तर संमोहनाचा वितळता बिंदू पकडण्यासाठी ते पाषाण टपलेले होते. कामपूर्तीनंतरच्या विकलांगांतल्या कैवल्याचा क्षण पकडणे सोपे नसते. त्यासाठी मनाळ (Psychedelic) दृष्टी असावी लागते. मैथुनशिल्पात व्यक्त होणारी आतुरता, उत्कंठा, अधीरता किती अस्पष्ट आणि किती अस्फुट असते! पाषाणांचे ते नम्रतेने ताठरलेले भाव होते. चुंबने मागण्यात तिथे लाचारी नव्हती, लीनता होती. कोकिळेच्या पंचमात राजहंसाची लवचीक कंठरेषा भिजवून काढलेली ती मैथुनचित्रे आहेत!

---

मूर्तिशिल्पाचे वैशिष्ट्य :

रॉय किणीकर कामशिल्प

खजुराहोच्या मूर्तिशिल्पांची वैशिष्ट्ये विविध प्रकारची आहेत. मुद्रा, अलंकार, वेषभूषा, केशरचना व देहाकार ह्यांचे रेखाटन. वक्ररेषापद्धतीची नि दक्षिणांग व हातांच्या सरळ रेखाटनाची, पुष्ट नितंब व स्तनयुगुलाच्या वर्तुळाकाराशी समतोलपणाने सांगड घातलेली आहे. शिल्पाची गतिमानता नुसती रेषांमध्ये नसून त्रिमित स्वरूपाची आहे. तत्कालीन शिल्पकाराने केलेला मानवदेहाचा अभ्यासही ह्या मूर्तीच्या मुद्रारेखाटनात आढळतो. चेहर्‍याचे अंडाकृती रेखाटन, कोरीव नक्षीकाम, अर्धोन्मीलित नेत्र आणि बाकदार भुवया, ही खजुराहोच्या मुद्रा रेखाटनाची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत.

खजुराहोच्या शिल्पांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दर्शनी भागावरचे रतिशिल्प. ह्याचे मिथुनशिल्प असे सामान्यतः वर्णन केलेले आढळते. प्रेमाचे विविध आविष्कार ह्या शिल्पात इतक्या सूक्ष्मतेने व यथातथ्यतेने रेखाटले आहेत, की दगडाला गतिमान करणार्‍या शिल्पकाराच्या कौशल्याने प्रेक्षक अक्षरशः भारावून जातो. चुंबन, आलिंगन, अवयवाचे विळखे व कित्येकदा सु-रत प्रसंगांचे रेखाटन पाहताना त्याच्या अशिष्टतेपेक्षा तादात्म्याच्या रेखाटनाचेच विशेष कौतुक वाटते. कलेच्या उत्कट आविष्काराकडे रसिक प्रेक्षकांचे विशेष लक्ष्य जाऊ नये किंवा त्याचा वासनात्मक परिणाम सामान्य प्रेक्षकांवर होऊ नये, इतके सामर्थ्य ह्या रतिशिल्पात प्रत्ययास येते.

आधुनिक नीतिशास्त्राच्या दृष्टीने ह्या रतिशिल्पातल्या रेखाटनात अशिष्टतेचे अधिक्य वाटले, तरी त्यातले सूक्ष्म मुद्राभाव प्रसंगोपात प्रकट झालेले आहेत.

खजुराहोचे हे रतिशिल्प पुराणमतवादी पाश्चात्त्यांना व त्यांच्या मतप्रणालीचे सहीसही अनुकरण करणार्‍या एतद्देशीयांना असभ्य वृत्तीचे निदर्शक वाटते.

---

रतिशिल्पातील कामपुरुषार्थ :

ह्या रतिशिल्पाची वैचारिक बैठक समजण्यासाठी प्रथम प्राचीन भारतीय समाजरचनेचे थोडे निरीक्षण करणे उपयोगाचे ठरेल. वेदकालीन समाजरचनेची वैशिष्ट्येच साकल्याने किंवा तपशीलवार जाणणे जरी युक्त असले, तरी रतिशिल्पाचा अभ्यास करताना तत्कालीन जीवनात कामपुरुषार्थाचे महत्त्व काय होते व त्याचा आविष्कार ललितकलांमध्ये कसा होऊ शकला, ह्याचा मागोवा घेणे प्रस्तुत ठरेल.

रॉय किणीकर कामशिल्प

वेदकाळात निरनिराळ्या शास्त्रांचे अध्ययन प्रचलित होते असे आढळते. व्युत्पत्ती, व्याकरण, नीती, भूमिती, खगोलविद्या, चिकित्सा इत्यादी शास्त्रांचे संदर्भ उपलब्ध आहेत. ह्याच काळी कामशास्त्राची सुरुवात झाली असावी व इतर शास्त्राबरोबर भारतात मानवी संस्कृतीच्या प्रगतीला त्यांनी हातभार लावला असावा.

मानवी देहाचे नैसर्गिक व्यापार व व्यवहार काय आहेत, शरीरवासना कशा पूर्ण कराव्यात, कामव्यवहाराची पार्श्वभूमी, परिचर्या आणि पूर्ती यांचे उद्देश काय आहेत इत्यादींचे वैज्ञानिक विवरण प्रस्तुत शास्त्रात स्पष्टपणे केलेले आढळते. आपल्या वासनांची पूर्ती व त्याबरोबर निग्रह कसा करावा; तेणेकरून कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा जबाबदार घटक कसे व्हावे याचे शास्त्रीय शिक्षण नागरिकाला प्राप्त व्हावे; हा ह्या कामशास्त्राचा प्रधान हेतू होता. वेदकालीन व तद्नंतरचे ग्रंथ पाहिले, तर ह्या शास्त्राच्या प्रत्येक अंगाचा सखोल अभ्यास त्यात केलेला आढळतो.

वात्स्यायनाचे कामसूत्र, कन्दर्पचुडामणि, कोकापण्डिताचे रतिरहस्य उर्फ कोकशास्त्र, पद्मश्रीचे नागरसर्वस्वम, कल्याण मल्लाचे अनंगरंग, कवी शेखराचे पंचसायक, हरिहराची शृंगारदीपिका, नागार्जुनाचे रतिशास्त्र हे प्राचीन ग्रंथ मुद्रित झालेले आहेत. ह्याशिवाय अनङ्ग-तिलक, अनङ्ग्दीपिका, अनङ्ग-शेखर, कामसमूह, भगवत कवीचे अष्टनायिका दर्पण, ईश्वर, कामित, कलावाद तंत्र, कलाविधितंत्र, कोकापण्डिताचे कलाशास्त्र, कामप्रकाश, गुणाकराचा कामप्रदीप, कामप्रबोध (या नावाचे दोन ग्रंथ), नित्यनाथकृत कामरत्न, वामनाचे कामशास्त्र, कामदेवाचे कामसार, कौतुक मंजिरी, पद्ममुक्तावल, मदनमंजिरी, मनोदय, योगरत्नावली, जयदेवाची रतिमंजिरी, विद्याधरकविकृत रतिरहस्य, हरिहरकृत रतिरहस्य, रतिरहस्य टीका, कांचीनाथकृत रतिरहस्यदीपिका, रामचंद्र सूरिकृत रतिरहस्य व्याख्या, रतिसर्वस्व रतिसार, विश्वेशवरकृत रसचंद्रिका, रसविवेका, वाजीकरण तंत्र, क्षेमेंद्रकृत वात्स्यायन-सूत्र-सार, वेश्याङ्गना कल्प, वेश्यांङ्गना वृत्ती, शांङ्गधकृत शृंगारपद्धती, शृंगार-भेदप्रदीप, शृंगार मंजरी, चित्रधरकृत शृंगारसारिणी, विष्णवङ्गिरसकृत समर काम-दीपिका, सुरतोत्वर कामशास्त्र, देवेश्वरकृत स्त्रीविलास, रेवणाराध्यकृत स्मर-तत्त्व प्रकाशिका,स्मरदिपिका, देवराज महाराजकृत रति-रत्न-प्रदीपिका, स्मर-रहस्य-व्याख्या, केशवकृत काम-प्रभृत, वरदार्यकृत कामानन्द, हरिहरकृत रतिचंद्रिका, आनंदकृत कोकसार भाषा ह्या ग्रंथांचे संदर्भ आणि हस्तलिखिते बिकानेर, औंध, मद्रास आणि पॅरिसच्या ग्रंथालयात उपलब्ध असल्याचा उल्लेख त्यांच्या सूचीत आढळतो.

ह्याशिवाय कामव्यवहाराचे उल्लेख अथर्ववेद, ऋग्वेद, तैतिरेय संहिता, बृहद्दारण्यक ह्या वेदकालीन उपनिषदांत; महाभारत व रामायण ह्या महाकाव्यांत; अग्नी, भविष्य, देवीभागवत, गरुड, हरिवंश, स्कंद, श्रीमद्भागवत, विष्णुधर्मोत्तर ह्या पुराणांत; आगर, आपस्तम्ब, अत्रिसंहिता, बृहद्यम, दक्ष, मनु, मारद, प्रजापती, शंख, वशिष्ट वृद्दहरित, विष्णु व याज्ञवल्क्य स्मृतीत; महाभाष्य ह्यासारख्या व्याकरणग्रंथात; कौटिलीय अर्थशास्त्रात; आयुर्वेदप्रकाश बृहत्संहिता, चरकसंहिता, शुशृतसंहिता ह्या वैदक ग्रंथांत; अश्वघोषकृत बुद्धचरित, चौरपंचशिका, गीतगोविंद, जानकीहरण, किरातार्जुनीय, कुमारसम्भव, मेघदूत, नैषधीयचरितम्, रघुवंश, शिशुपालवध इत्यादी काव्यग्रंथांत; कादम्बरी, दशकुमारचरित ह्या प्रबंध ग्रंथांत; अमरुशतक, आधारशतक, समयमातृका, शृंगारशतक, सुभाषितरत्नकार इत्यादी संकीर्णग्रंथांत; शृंगारतिलक, धूर्तसमागम इत्यादी भाणग्रंथांत; धूर्ताख्यान, पौमचरियम्, कुट्टनीतम्, गाथासप्तशती इत्यादी प्राकृत ग्रंथांत आढळतात.

अलंकारशास्त्राचा संबंध कामशास्त्राशी असल्यामुळे केशवमिश्रकृत अलंकारशेखर, गोविंदकृत काव्यप्रदीप, वाग्भटाचे काव्यानुशासन, रुद्रटकृत काव्यालंकार, जयदेवकृत चंद्रलोक, जगन्नाथकृत रसगंधार, भरतमुनीकृत नाट्यशास्त्र, भोजकृत सरस्वती कण्ठभरण, विश्वनाथाचे साहित्यदर्पण व मम्मटाचा काव्यप्रकाश इत्यादी ग्रंथांत अनेक ठिकाणी कामशास्त्रासंबंधीचे उल्लेख आढळतात.

---

साधारणतः १९६८-१९७२ ही पाच वर्षे माझा मुक्काम कोल्हापुरात होता. संस्कृतीच्या अनेक अंगांचा अभ्यास करण्यात माझे जगणे असते. जिवंत राहण्यासाठी मी भारतात अनेक ठिकाणी हिंडलो आहे आणि त्या-त्या वास्तव्यात मी अनेक प्रकारचे अनुभव घेतले आहेत. मुख्यतः कोनार्क-खजुराहो येथील मुक्कामात माझे जीवन विशेष समृद्ध झाले, दृष्टी आणि जाणिवा विशेष प्रगल्भ झाल्या. परिणामी माझ्या चिंतनाला दिशा मिळाली आणि हे सर्व लेखन मी अनुभवांमुळे लिहू लागलो. काम (Sex) या विषयावर मी उपखंडात 'कोनार्क' नावाची कादंबरी लिहिणार आहे. त्यातील पहिला भाग लिहून झाला आहे. गंमत म्हणजे, चिंतनपर लेखन मी करू लागलो ते मात्र काही कविता लिहूनच! म्हणूनच त्या कविता इथे वाचकांसाठी देण्याचा मोह मला आवरत नाही.

ह्या सर्व कविता वेळोवेळी जशा सुचल्या, तशाच त्या पुढे देत आहे.

मृद्गंध उमलला, आले मृग नक्षत्र
चालली अवेळी, ओलेती अपरात्र।
वाकली जरा, पिळताना ओला पदर
आतून जरासे, हलले अर्धे दार॥

चांदणे सोडले, गालावरती चिंब
पदरात झिरपले, पुनवेचे प्रतिबिंब।
दे भरुनि आणखी, पुन्हा भरू दे पेला
एकदाच आला, क्षण गेला तो गेला॥

हा असा राहू दे, असाच खाली पदर
हा असा राहू दे, असाच ओला अधर।
ओठात असू दे, ओठ असे जुळलेले
डोळ्यांत असू दे, स्वप्न निळे भरलेले॥

ही रात्र आजची, पुन्हा न भेटायाचे
हे दार आतुनी, पुन्हा न लागायाचे।
मिटू नकोस डोळे, अर्ध्यावर मिटलेले
पुसू नकोस ओघळ, स्वप्नांचे फुटलेले॥

काळोख खुळा, अन् खुळीच काळी राणी
संकोच मावला, मिठीत सुटली वेणी।
अंजिरी चिरी, विस्कटे, सुटे निरगाठ
ओठात चुंबने, भरली काठोकाठ॥

भरदार कुसुंबी काठ, दाटली चोळी
येतसे अपूर्वा, उषा सावळी भोळी।
रोमांचित झाली, कितीक येथे युगुले
चुंबने दिली घेतली, बिलगुनी जवळी॥

बेसावध पदराआड, भेटले डोळे
अन् टोक जिभेचे, अधरावरुनी फिरले।
रंगला रक्तचंदनी पदर, अन् पोत
पान्हावली स्वप्ने, भरलेल्या पदरात॥

या इथे घेतली, त्या दोघांनी शपथ
चुरगळले पदराआड, जरासे हात।
घातली मिठी, आवळून दोन्ही बाहू
अडवून म्हणाली, नका नका ना जाऊ॥

ओठात अडकले चुंबन, रुसले गाल
कोयरीत हिरवा चुडा, विरघळे लाल।
घालता उखाणा, फणा रुपेरी खोल
अंकुरले अमृत, ढळता नाभीकमळ॥

मधुचुंबन म्हणजे, क्षणभर धुंद विरक्ति
आलिंगन म्हणजे, विरहाची आसक्ति।
हे जीवन म्हणजे, दीर्घ स्वप्नसंभोग
हे जीवन म्हणजे, मृगतृष्णेची आग॥

==========

संदर्भ :
कामसूत्र : वात्स्यायन मुनी
रतिरहस्य : कोका पंडित
अनंगरंग : कल्याणमल्ल
नारदीय सूक्त : अहिताग्नी राजवाडे
The wonder that was India: B.L. Bashaam
Introduction to Indian Art: Dr. Anand K. Coomorswamy
Hindu culture: Radhakamal Mukerji
Indian Temples & Sculpture : Dr. goswamy
Kam-kala: Dr. Mulkraj Anand
Konark: Rustum J. Mehta
The Erotic sculpture of India: Max-Pol Fouchet
The Ancient Art & Architecture of India: S.B.Havell
Khajuraho: Vidya Prakash
An Approach to Hindu Erotic Art: Alain Danielou
G.D.Khosha's report on Oscenity and Nudity

---

'शिल्पायन' या पुस्तकातील 'कामशिल्पे' या लेखाचे अंशात्मक पुनर्प्रकाशन

विशेष आभार :
लेखक : रॉय किणीकर
संपादक : अनिल किणीकर
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे


पाचवीला पुजलेली सटी

 

सटीचा लेखाजोखा

      आतल्या खोलीतून नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. बाहेरच्या बाजूला मात्र काही साहित्याची जमवाजमव चाललीय. ‘मालटा’ नावाने ओळखला जाणारा दगडी दिवा, जाते, पाटा-वरवंटा अशा दगडी साहीत्याची यादी केली जातेय. कधीकाळी नेहमीच्या वापरात असलेल्या या वस्तू,  पण सध्याच्या काळात मिळवणे दगडासारखेच कठीण झाल्यासारख्या. ही सर्व जमवाजमव चालली आहे ती जन्माला आलेल्या बालकाला कुठलीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आयुष्य व आरोग्य लाभावे या हेतूने केल्या जाणाऱ्या पाचवीची. सहसा मुलीकडे होणारा हा विधी. संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार साम्य-भेदाने होत असलेला हा विधी पश्चिम किनारपट्टीवरील रायगड परिसरातही होताना दिसतो.
    या विधीवेळी लहान बाळाला वस्त्रांशिवाय निंगडीच्या म्हणजेच निरगुडीच्या पानांवर झोपवले जाते. या पानांवरून उचलण्याचा मान आत्याचा असतो. निरगुडी ही वनस्पती आयुर्वेदाच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मानले जाते. पाचवीच्या या विधीमध्ये एका सुपात तांदळावर कलश ठेवतात. त्यावर नारळ ठेवून केळीच्या पानाचा लहानसा भाग उभा केला जातो. समोर पानाचे पाच विडे मांडून त्या विड्यांवर सुपारी,बदाम, खारीक,अक्रोड,हळकुंड यांसारखे पदार्थ मांडले जातात. या दिवशी घुगऱ्या ,उकडीच्या पीठाचे मुटके, पिठाचा दिवा बनवला जातो. बाळंतिणीच्या खाटेच्या चार पायांजवळ चार पीठाचे दिवे व एक दिवा मोरीजवळ ठेवतात.
    जिल्ह्याच्या उत्तर भागातील विधीमध्ये नाममात्र फरक असतो. इथे पाट्यावर वरवंटा ठेवून सात विड्याची पाने देठ खाली करून वरवंट्याला टेकून ठेवतात .पानाच्या टोकांना शेंदूर लावतात. काजळाची दोन बोटे प्रत्येक पानाला दोन डोळे म्हणून लावतात. काही ठिकाणी रुईच्या पानांवर ‘सटी व लाठा’ अशी दोन चित्रे काढली जातात. समोर पीठाचे सात दिवे व पाटयाच्या चार कोपऱ्यांना चार पीठाचे दिवे लावतात. प्राचीन परंपरेची जपणूक करणारा मालटा हा दगडी दिवा पाट्याच्या मध्यभागी लावतात. नंतर पूजन करून नैवैद्य दाखवला जातो.

    याच विधीला ‘सटी’ असेही म्हटले जाते. ही सटी म्हणजे ‘सटवाई’ किंवा ‘सटवी’ या नावाने ओळखली जाणारी आणि प्राचीन काळापासून पुजली जाणारी मातृदेवता. अगदी शिवी म्हणून वापरला जाणारा हा शब्द खरंतर मूळ संस्कृत ‘षष्ठी’ या शब्दापासून तयार झाला आहे. मुलाच्या जन्मानंतरच्या सहाव्या रात्री ‘सटवी’ देवीची शांती करण्यासाठी रात्रभर दिवा लावून ठेवतात. पाट्यावर एक नारळ, कोरा कागद, पेन किंवा पेन्सिल, मुलगा असेल तर हातोडा व मुलगी असेल तर कोयती असे एक शस्त्रही ठेवतात व त्यांचे पूजन करतात. त्या रात्री देवी स्वत: येऊन त्या मुलाच्या कपाळावर त्याचे अदृश्य पण अटल भवितव्य आणि स्वभाववैशिष्ट्य लिहिते, असा समज आहे. यालाच ‘ब्रम्हलिखित’ असे म्हटले जाते. "सटीचा लेखाजोखा, न चुके ब्रम्हादिका" अशी एक म्हण या देवीबाबत प्रचलित आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे. रस्त्याच्या कडेला किंवा चौरस्त्यावरील दगडावर दिसणाऱ्या लाल रेघा, अर्पण केलेले अन्न आणि कापलेला लिंबू ह्या सटवीच्या व्रताच्या खुणा. रात्रीच्या वेळेस उपासक स्त्रीद्वारे हे क्रियाकर्म केलेले असते.

 सटवी, सटुआई, सटी,षष्ठी,रानसटवाई, छटी, घोडा सटवाई या नावांनी ओळखली जाणारी ही मातृदेवता आहे तरी कोण?
या मातृकेशी विशिष्ट प्रकारचे नाते असलेल्या स्कंदाला ‘षष्ठीप्रिय’ म्हणतात. स्कंद म्हणजेच शिवपुत्र कार्तिकेय. काश्यपसंहितेप्रमाणे षष्ठी ही स्कंदाची बहिण आहे. स्कंद व विशाख हे तिचे दोन भाऊ. तर याऊलट ‘देवी भागवत पुराण’ व महाभारतानुसार ती स्कंदाची पत्नी आहे. इथे ती देवमेना या आणखी एका उपनावाने ओळखली जाते. सुश्रुतसंहिता षष्ठीला ‘रेवती’ हे आणखी एक नाव देते.  कुषाणकाळातील एका मूर्तीमध्ये षष्ठी स्कंद आणि विशाख या दोघांमध्ये उभी असलेली दिसते. तिचे षष्ठी हे नाव सार्थक करणारी ही मूर्ती आहे. कारण या शिल्पात तिच्या खांद्यावर ओळीने पाच डोकी दिसतात. कुषाणकाळानंतर शिल्प क्षेत्रांत हा प्रकार लुप्त झाला. सटवाई देवी अनेक गावांची ग्रामदेवता आहे. हिच्या देवळाचे सहसा बांधकाम करीत नाहीत. फक्त आडोसा असतो. असे असले तरी गुप्त काळांत मात्र बांधकाम होत असल्याचे दिसते. स्कंदगुप्ताच्या काळातील एका लेखांत छंदक नावाच्या व्यक्तीने षष्ठीदेवीचे एक मंदिर बांधल्याचा उल्लेख आहे. याच काळात षष्ठीदेवीच्या नावाला धरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत होती. सन ५३२ मध्ये मध्यप्रदेशातील मंदसोर येथे कोरलेल्या यशोधर्मन उर्फ विष्णुवर्धन याच्या लेखांत ‘षष्ठीदत्त’ नावाची व्यक्ती आढळते, तसेच द्रोणसिंहाच्या भामोद्रामोहता ताम्रपटाचा क्षत्रक नावाचा लेखक ‘षष्ठीदत्तां’चा मुलगा होता. बंगाली लोकांत षष्ठीचरण हे नाव आज ही आढळते.
   प्राचीन काळापासून या देवीला पुजले जात असले तरी  पुरूषांचा तिच्या पूजेशी काही संबंध नसतो. षष्ठी-सटी-सटवी म्हणजेच शक्तीचे दुर्गा हे रुप मानले असले तरी लोकमताप्रमाणे ती अविवाहित आहे. ‘म्हसोबाला नाही बायको आणि सटवीला नाही दादला’ असे म्हटले जाते. याच कारणांमुळे ‘पाचवी-सटी’ या कार्यक्रमाच्या वेळेस पुरुषांची उपस्थिती टाळली जाते. परंतु कालांतराने जसे दगडी दिव्याची जागा धातूच्या दिव्याने घेतली, तसेच या ‘लेडीज स्पेशल’च्या कार्यक्रमात पुरूषांनीही शिरकाव केला. कोणत्याही कार्यक्रमाची सांगता ‘मांस-मद्या’शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशी श्रद्धा असणारा एक वर्ग या प्राचीन संस्कृतीला अर्वाचीन पद्धतीने साजरा करतोय. ‘अर्थ समस्या’ नावाची गोष्ट पाचवीलाच पुजलेल्या मुलींच्या पालकांसाठी ही नवी प्रथा अनर्थाकडे नेत आहे. यामुळे आधीच समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मुलीकडील लोकांना हा ‘जादाचा भुर्दंड’ बसतो. अर्थात संस्कृतीत घडणारे नवे बदल स्विकारायला हवेतच, पण हे बदल असंस्कृत नसतील याची काळजी घ्यायला हवी. या नव्या प्रथांना आवर घालायलाच हवा. देवी सटवाईच या नव्या प्रथाकारांच्या भाळी सद्बुद्धी लिहो, ही सदीच्छा!

                          - तुषार म्हात्रे , पिरकोन (उरण)
 
 https://tusharki.blogspot.com/search?updated-max=2019-11-20T06:40:00%2B05:30&max-results=7&start=21&by-date=false

https://indraneelb.blogspot.com/2021/03/blog-post_91.html

कृष्ण आणि पुतना


लेख - १५

कृष्ण हे भारतीय धार्मिक परंपरेमध्ये असलेले असे चरित्र आहे ज्याने सर्वांना त्याच्या कथांमध्ये बांधून ठेवले आहे. बाळकृष्ण, यशोदेला प्रश्न विचारून भंडावून सोडणारा कृष्ण, गोपिकांबरोबर खेळणारा कान्हा, कंस वध करणारा जबाबदार तरुण कृष्ण आणि महाभारतात अर्जुनाचा सारथी होऊन आयुष्याचे आणि या सृष्टीचे तत्वज्ञान गीतेत संगणारा, विश्र्वरूप दर्शन देणारा भगवान श्रीकृष्ण. अशा अनेक वेगवेगळ्या रूपांमध्ये तो आपल्याला दिसतो. वेगवेगळ्या कलांमध्ये देखील कृष्णाची ही रूपं आपल्याला बघायला मिळतात. कृष्ण चरित्रतला महत्त्वाचा भाग म्हणजे त्याने बाळ असताना केलेला अनेक असुरांचा वध.

पुतना नावाच्या एका राक्षसिणीला कृष्णाचा वध करायला कंस मामाने पाठवले. आपल्या स्तनांना विषाने भरून ती यशोदेच्या घरात रूप बदलून आली. योग्य संधी साधून तिने कृष्णाला स्तनपान करायला घेतले. पण शेवटी दैवी अवतार असलेल्या कृष्णाने तिचे हे रूप ओळखून तिचा वध केला अशी ही कथा आहे.
मध्य प्रदेशात विदिशा जवळ बिजा मण्डल नावाचे एक प्रचंड मोठे पण भग्न मंदिर आहे. त्या मंदिराच्या एका खांबावर हे छोटेसे शिल्पं आहे. यामध्ये एक स्त्री आपल्या मांडीवर घेऊन त्या बाळाला स्तनपान करते आहे. स्तनपान हे मातृत्वाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपल्या बाळाला जवळ घेऊन, घट्ट पकडून ही क्रिया होते. पण या शिल्पामध्ये त्या स्त्री ने बाळाला स्तनपान देताना देखील आपले दोन्ही हात हे वर घेतले आहेत आणि हाच फरक आहे कलाकाराने दाखवला आहे.

एवढ्याश्या शिल्पातून एवढी मोठी कथा दाखवणाऱ्या कलाकाराचे कसब किती अगाध असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. कृष्ण आणि अनुषंगाने वैशव प्रभाव भारतात मोठ्या प्रमाणात वाढण्यात भारतीय कलांचे योगदान खूप मोठे आहे.

शिल्प - कृष्ण आणि पुटना
बिजा मण्डल, मध्य प्रदेश
९ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

 

शिव


लेख - २

शंकर किंवा शिव हा भारतात पुजल्या जाणाऱ्या महत्वाच्या देवतांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा देव. या शंकराचे मूळ काही हजार वर्ष मागे जाते. अतिप्राचीन कालखंडात लिंग रूपाने पूजन होणारा देव, जनन आणि पुनर्निर्मिती दाखवणारा देव, वेदांमध्ये दिसणारा रुद्र, महायोगी शिव, सगळं काही आपल्या क्रोधाने नष्ट करणारा प्रलय आणि त्याच वेळेला परम भक्ताच्या मागण्या पूर्ण करणारा शिव, अशा शेकडो छटा या महादेवाच्या आहेत. स्मशानात अंगाला राख फासून राहणाऱ्या साधुंपासून ते तलम वस्त्र घालून राजवाड्यात राहणाऱ्या राजापर्यंत सगळ्यांना याने आपल्यात सामावून घेतले आहे. मंदिराच्या गर्भ गृहात प्रामुख्याने लिंग स्वरूपात याचे पूजन होत असेल तरीही शिल्पशास्त्रात शंकर या संकल्पनेवर मोठ्या प्रमाणात प्रयोग  झाले आहेत.

शंकराच्या शिल्पामध्ये काही प्रमुख गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. डोक्यावर असलेल्या जटा किंवा जटा मुकुट, कपाळावर कोरलेला तिसरा डोळा, हातात पकडलेला त्रिशूळ, शिवाला अत्यंत प्रिय असलेले वाद्य म्हणजेच डमरू, इत्यादी लांच्छने बघून शिवाचे शिल्प ओळखता येते.

आता या फोटोमध्ये असलेल्या शिवाचे निरीक्षण करूयात. आधी सांगितल्याप्रमाणे डावीकडून उजवीकडे असे निरीक्षण करायचे आहे. मूर्ती स्थानक म्हणजेच उभी आहे, हातामध्ये पकडलेला त्रिशूळ आणि त्या दंडाला खाली वेटोळे दिलेला नाग, कमरेवर नेसलेले वाघाचे कातडे (गुडघ्याजवळ वाघाचे तोंड दिसेल), डोक्यावर असलेला जटा मुकुट, पाठीमागे कोरलेली प्रभावळ किंवा वलय हे त्याच्या दैवत्वाचा पुरावा देतात.
लिंगपुराण, शिवपुराण, इत्यादी पुराणांमध्ये शंकराच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. वेदांमध्ये छोट्या प्रमाणात दिसणारा रुद्र ते पौराणिक कालखंडात प्रमुख देव म्हणून दिसणारा शिव हा प्रवास खरंच अद्भुत आहे.

मूर्ती - केवल शिव, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर 

9960936474

गणपती देवता: उगम व विकास – डॉ.अशोक राणा

 https://satyashodhak.com/ganpati-deity-origin-and-developmet/

मंगलकार्याच्या आरंभी गणपतीला वंदन करण्याची प्रथा आपल्या देशात वर्षानुवर्षे चालू आहे. अगदी ऋग्वेदातील ऋचांपासून तो तमाशातील गण-गौळणींच्या नमनापर्यंतचे सारे संदर्भ गणपतीच्या अग्रस्थानाला मान्यता देणारे आहेत. आजही एखाद्या नव्या कामाची सुरूवात करायची झाल्यास गणेशाचे वंदन पहिल्यांदा केले जाते. त्यामुळेच तर कार्याच्या आरंभाला ‘श्रीगणेशा ‘ असे म्हटले जाते. यावरून अग्रपूजेचा मान मिळालेल्या गणपतीला आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे, हे साऱ्यांनीच मान्य केले आहे असे दिसून येते.

विवाहकार्यात गणपतीला किती महत्त्वाचे स्थान आहे हे आपणास माहित आहेच. गणपतीच्या लग्नकार्यातील महत्त्वाची जाणीव आपल्या मनात इतकी घट्ट आहे की, खुद्द गणरायांच्या मात्या-पित्यांच्या, शिवपार्वतीच्या विवाहप्रसंगीही पहिल्यांदा गणपतीचे पूजन केले गेले असावे, असे वाटायला लागते. यात गंमतीचा भाग वाटत असला तरी आठव्या शतकात तयार झालेल्या वेरूळच्या कैलास लेण्यातील शिवपार्वती विवाहाचे शिल्प ज्यांनी पाहिले असेल, त्यांना शिवपार्वतीच्या मधोमध वरच्या भागाला गणपतीची मूर्ती दिसेल. याठिकाणी गणपती शिव-पार्वतीचा पुत्र, मग तो आपल्या माता-पित्यांच्या विवाहप्रसंगी कसा उपसिथत राहील ? असा प्रश्न शिल्पकाराच्या मनात आलाही नसेल. गणपतीचा अग्रपूजेचा मान व मंगलकार्यारंभी त्याची उपस्थिती आवश्यक असलीच पाहिजे ही धारणा जनमानसात घट्टपणे रूजल्यामुळे शिल्पकारांनीही तसे केले असावे. असा हा लोकांचा लाडका गणपती केव्हा अस्तित्वात आला असावा हा प्रश्न विद्वानांच्या मनात वर्षानुवर्षे रुंजी घालत आहे.

गणपतीचा उगम केव्हा झाला?

एखाद्या नदीच्या उगमाचा शोध लावता येतो ; पण एखाद्या देवतेचाही उगम केव्हा झाला हे सांगता येईल काय ? विशेष करून सर्वांनाच अग्रभागी पूज्यस्थानी असलेल्या गणरायाची – गजाननाची निर्मिती कोणत्या काळात झाली असावी ? गजाननाच्या भाविक भक्तांच्या मनात असे प्रश्न निर्माण होणार नाहीत. त्यांना तर तो सृष्टीनिर्माता, जगत्पालक व कर्ताधर्ता वाटतो. ऋषींचे कुळ व नदीचे मूळ पाहू नये म्हणतात ना, तसे आपल्या आराध्य देवतेचे मूळही पाहू नये असेच ते म्हणतील. पण आजच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे प्राप्त झालेल्या चिकीत्सकवृत्तीच्या माणसाला मात्र गणपती या देवतेचे मूळ कशात आहे,असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. रोज जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडत आहे, कोणकोणते नवे शोध लागत आहेत ; याविषयीची माहिती दूरदर्शन, इंटरनेट, सायबरस्पेस या संगणककेंद्रित प्रसार माध्यमांबरोबरच भ्रमणध्वनी, वृत्तपत्रे, नियतकालिके इत्यादी माध्यमांच्याद्वारा आपणास मिळत आहे. म्हणूनच आजच्या युगाला ‘माहितीचा स्फोट’ असलेले युग म्हटले जाते. अल्वीन टॉफलर या जगविख्यात लेखकाने आपल्या ‘फ्युचर शॉक’ या शोधग्रंथात लिहिले आहेच की, आपली इच्छा असा वा नसो, इलेक्टॉनिक माध्यमांच्याद्वारे तुमच्या डोक्यात माहिती आढळून पडेल. अशा माहितीमुळे आपल्या जुन्या धारणांना हादरे बसतील. अशा धक्क्यांनीच पुढील पिढी अधिक सुजाण बनणार आहे. मारिया मॉन्तेस्सोरी या बालशिक्षण तज्ञ महिलेने तर आपण गर्भाबाहेर पडल्याबरोबर अनेक धक्क्यांना सामोरे जात असतो व शिकत असतो असे म्हटलेले आहे. विसाव्या शतकाने अखिल मानवजातीला दिलेली नवनव्या माहितीची देणगी एकविसाव्या शतकाचा वारसा म्हणून मिळणार व म्हणूनच तिच्यानुसार आपली मानसिकताही बदलावी अशी अपेक्षा केली जाईल. या पार्श्वभूमीवर गणपती या देवतेचा उगम शोधण्याच्या प्रयत्नात आपल्या पारंपरिक धारणांना धक्के बसल्यास आपण भांबावून जाता कामा नये. अशीच एक माहिती म्हणजे,गजानन म्हणजे हत्तीचे मुख असलेल्या गणपती देवतेचा उगम केव्हा, म्हणजे कोणत्या काळात झाला असावा ही आहे.

गजाननाचा उगम गुप्तकाळात!

भारत व भारताबाहेरही ज्या गणरायाच्या गजमुख मूर्ती सापडतात व त्यांची मोठया भक्तिभावाने पूजा केली जाते,त्या गजमुख गणपती मूर्तीचा पहिल्यांदा आढळ होतो तो गुप्त काळात. गणेशोत्सवात तसेच दैनंदिन पूजा-पाठात ज्या गणेशाची आपण सर्व मोठया भक्तिभावाने पूजा-अर्चा व आरती करीत असतो, तो गणराज गजानन केवळ दीड हजार वर्षापेक्षा जुना नाही असे म्हटले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

प्राचीन भारतीय इतिहासाच्या संशोधकांनी शोधलेली ही धक्कादायक माहिती खरोखरच खरी आहे. विशेष म्हणजे ऐतिहसिक पुराव्यांच्या आधारे हे सत्य जनतेपुढे पहिल्यांदा मांडले ते, दिवं.रामकृष्ण भांडारकरांनी. नंतर त्यावर विद्वानांमध्ये खूप वादविवाद झालेत. या साऱ्या वादांचा परामर्श घेत डॉ.वा.वि. मिराशी यांनी ‘संशोधन मुक्तावली : सर पाचवा या विदर्भ संशोधन मंडाळाच्या वार्षिकात आपले मत ठामपणे मांडले. ‘ या शतकाच्या पूर्वार्धात (१९१३मध्ये) डॉ.भांडारकरांचा ‘ वैष्णव व शैव पंथ आणि इतर गौण धर्मसंप्रदाय ‘ हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथात त्यांनी ख्रिस्तोत्तर’ पाचव्या शतकाची अखेर व आठव्या शतकाची अखेर या दोन मर्यादांमधील काळात गणपतीची उपासना प्रचलित झाली असावी असा निष्कर्ष नोंदविला आहे.

गुप्तकालातील एकाही कोरीच लेखात गणपतीचा उल्लेख नाही किंवा त्याला दिलेल्या दानाचा उल्लेख नाही. यावरून त्यांनी आपले वरील मत मांडले आहे. त्याचबरोबर ‘कालिदासाच्या एकाही ग्रंथामध्ये गणपतीचा उल्लेख नाही’,असे ते म्हणतात. कालिदासाच्या काळात गणपतीपूजन प्रचलित नव्हते असे संशोधकांचे मत आहे. कालिदास हा द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्य याच्या आश्रयास होता हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे डॉ.मिराशी यांनी आपल्या ‘कालिदास’ या शोधग्रंथात सिद्ध केले आहे. ‘चंद्रगुप्त सुमारे इ.स.३८०ते ४१३ या काळात होऊन गेला. साधारणपणे इ.स.४००च्या सुमारास कलिदास झाला. गजाननाची उपासना इ.स.४५० ते ५००च्या काळात प्रचलित झाली असावी. त्यामुळे कालिदासाने आपल्या ग्रंथात गजाननाचा साधा उल्लेखही न करणे स्वाभाविक आहे,” असे डॉ.मिराशी म्हणतात. नोव्हेंबर १९६३ व फेब्रुवारी १९६४ या वाई येथून प्रकाशित होणाऱ्या ‘नवभारत’ या मासिकाच्या अंकांमध्ये अ. ज. करंदीकर व द. धों. वझे यांनी ‘गुप्तकाळात गजाननाची उपासना प्रचलीत होती काय? या विषयावर विचारमंथन करणारे लेख लिहिलेत. त्यांचा मुद्देसूद समाचार घेताना डॉ. मिराशी यांनी आपली रोखठोक मते मांडली आहेत. प्राचीन ग्रंथांमध्ये व कोरीव लेखात गजाननाचा उल्लेख नाही. पण गुप्तकाळातील एका गुहेत गजनानाची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे गजाननाची उपासना गुप्तकाळापासून सुरू झाली असावी व त्यामुळेच सध्या प्रचलित असलेल्या गजमुख गणपतीचा उगम गुप्तकाळात झाला असावा हे सिद्ध होते.

पहिली गजानन मूर्ती:

मध्यप्रदेशातील विदिशा जिल्हयातील उदयगिरी (प्राचीन नीचैगिरी) टेकडीतील सहा नंबरच्या गुहेत गजाननाची पहिली–वहिली मूर्ती कोरलेली आहे. विदिशेच्या वायव्येस चार कि. मी. अंतरावर असलेल्या उदयगिरी येथे सुमारे वीस मानवनिर्मित गुहा आहेत. या इ. स. पाचव्या शतकातील असाव्यात असे संशोधकांचे मत आहे. यापैकी गुहा क्र. ६ मध्ये द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळातील इ.स. ४०१चा कोरीव लेख आहे, पण या लेखात गजाननाचा उल्लेख नाही. याचा अर्थ तोपर्यंत गजाननाची उपासना प्रचलित नव्हती. अर्थात गुप्तकाळाच्या उत्तरार्धात ती सुरू झाली असावी असेही ते म्हणतात. गुप्तकालाच्या पूर्वार्धात शैव संप्रदायामध्ये गणपतीचा अंतर्भाव झाला नसावा, या आपल्या मताच्या पुष्टयर्थ त्यांनी काही पुरावे दिले आहेत. तें म्हणतात, “ प्राचीन काळच्या गुहात व देवळात सात किंवा आठ मातृकांच्या मूर्ती आढळतात. ब्राह्मी, माहेश्वरी, वैष्णवी, कौमारी, ऐंन्द्री, वाराही, नारसिंही आणि चामुंडा अशी त्या आठींची नावे आहेत. या मातृकांजवळ आरंभीच्या शिल्पपट्टात कार्तिकेयाची मूर्ती आढळते. पुढे गणतीची उपासना प्रचारात आल्यावर कार्तिकेय किंवा वीरभद्र यांच्याबरोबर गणपतीचीही मूर्ती कोरण्याचा प्रघात पडला.

गुप्तकालीन कोरीव लेखात मातृकांबरोबर स्कन्द कार्तिकेयाचाच उल्लेख आढळतो, पण गणपतीचा आढळत नाही. गणपतीची पूजा पार्वतीचा पुत्र म्हणून गुप्तकालात प्रचारात आली असती, तर मात्र कोरीव लेखात त्याचाही उल्लेख झाला असता. बसाढ (प्राचीन वैशाली) येथे गुप्तकालीन अनेक मुद्रा सापडल्या आहेत, पण त्यापैकी एकीवरही गजाननाचे चित्र किंवा आकृती नाही. पण गुप्तकालाच्या अखेरीस गणपतीची उपासना प्रचारात आली असावी. याचबरोबर गजाननाच्या रेखीव मूर्ती तयार करणे सुरू झाले असावे. गुप्तकालीन प्राचीन देवालय भूमरा येथे अशी एक मूर्ती सापडली आहे. नागोद संस्थानातील उचहरा किंवा उन्चरा नगराच्या पश्चिमेस हे गाव आहे.
सन १९२० मध्ये राखालदास बॅनर्जी यांनी या ठिकाणी उत्खनन करून या मूर्तीचा शोध लावला. या गजानन मूर्तीला छोटे अधोवस्त्र असून ती जाडजूड आसनावर बसलेली असल्याचे दिसते. उंदीर हे गजाननाचे मात्र या मूर्तीत नाही. याचा अर्थ या काळापर्यंत तरी उंदीर गजाननाचे वाहन आहे ही धारणा प्रचलित नसावी. गजाननाने पायात पैंजण, बाहूत अंगद आणि हातात कंकण धारण केले आहे. त्यांच्या गळयात कंठी आणि पोटावर उदरबंध आहे. शिवाय त्याने निष्काचा हारही यज्ञोपवितासारखा घातला आहे. डोक्यावर रत्नजडित मुकूट आणि मस्तकामागे प्रभावलय आहे. त्याचा एक दात दाखविला आहे. दोन्ही हात भंग झाल्यामुळे त्या त्या हातांमध्ये काय धारण केले होते हे कळायला मार्ग नाही.

सहाव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेल्या वराहमिहिर या ज्योतिर्विदाने आपल्या बृहत्संहिता या ग्रंथामध्ये गणपतीची मूर्ती कशी असावी हे सांगितले आहे ते असे –

प्रमथाधिपो गजमुख: प्रलम्बजठर: कुठारधारी स्यात् ।
एकविषाणो बिभ्रन्मूलककन्दं सुनीलदलकन्दम् ॥
(बृ.सं.अ. 58)

गणपती हा प्रमथांचा अधिपती, गजमुख, लम्बोदर, कुठार धारण करणारा, एकदन्त, मूलककन्द व सुनीलदलकन्द धारण करणारा असावा. सध्याच्या गणपती या वर्णनाबरहुकूम आहे असे दिसते. भूमरा येथील मूर्तीही सध्याच्या गजानन मूर्तीशी साधर्म्य साधणारी आहे. यानंतर गजवदन गणपतीच्या अनेक प्रकारच्या मूर्ती तयार झाल्यात व गणपती उपासक व्यापाऱ्यांनी व परदेशी गेलेल्या प्रवाशांनी त्या देशोदेशी पोहचविल्या. त्यामुळेच भारताबाहेरही गणपतीच्या मूर्ती सापडतात. गुप्तकाळामध्ये तिबेट, चीन, जपान, कोरिया इत्यादि पूर्व आशिया खंडात गणपतीची पूजा सुरू झाली.

गणपतीचे प्राचीनत्व(?)

इतिहास संशोधकांनी जरी अनेक पुराव्यांच्या आधारे गुप्तकाळाचा उत्तरार्ध हा गजवदन गणपतीचा काळ ठरविला असला तरी गणपतिविषयक लिखाण करणारे बहुतांश लेखक ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत. वेळोवेळी गणेशोत्सवाच्या दरम्यान प्रसिद्ध होणाऱ्या लेखांमध्ये गणपतीची उपासना वेदकाळापासून सुरू होती,असा आवर्जून उल्लेख ते करतात. श्रद्धेने ओथंबलेल्या अशा लिखाणांमध्ये सृष्टीच्या प्रारंभापासून गणपतीचे अस्तित्व असल्याचेही ठोकून दिले जाते. प्रणवरूप ॐकार हाच परमेश्वराचा हुंकार आहे व तेच गणपतीचे निराकार रूप होय असे सांगून अनेक काव्यात्मक प्रतिकेही उदाहरणादाखल वापरली जातात. याचबरोबर गणपती ही अनार्याची नव्हे, तर आर्यांचीच देवता आहे,कारण ऋग्वेदापासून तो पुराणापर्यंतच्या आर्यग्रंथांमध्ये तिचे उल्लेख आढळतात असे युक्तिवाद केले जातात. या साऱ्या युक्तिवादांचे आधार व त्या आधारावर जोपासलेले भ्रम किती तकलादू आहेत, हे वस्तुनिष्ठ चिकित्सेनंतर स्पष्ट होते. गणपती या शब्दाचा उगम व गजवदन गणपतीचा त्याच्याशी असलेला संबंध या विषयाची जाण असलेला कुणीही अभ्यासक असे भ्रम जोपासणार नाही हे ही तितकेच खरे. म्हणून पहिल्यांदा वैदिक वाङ्मयातील गणपतीचे उल्लेख कोणत्या संदर्भात आलेले आहेत ते पाहूया.

वैदिक वाङ्मयातील गणपती

ऋग्वेद हा जगातील सर्वात प्राचीन सुसंबद्ध ग्रंथ मानला जातो. ऋग्वेदांच्या दुसऱ्या मंडलामध्ये गणपतीला आवाहन करणारी ऋचा आली आहे, ती अशी –

गणानाम् त्वा गणपतिं हवामहे, कविं कवीनामुपश्रवस्तम्,
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्न्तिभिं: सीद सादनम् ।
( हे ब्रह्मणस्पते, तू गणांचा अधिपती आहेस. कविंचा कवी आहेस, तुझ्याजवळ विपुल अन्न आहे, तू ज्येष्ठ आहेस. यज्ञस्थळी येऊन आसनस्थ हो असे आम्ही तुला आवाहन करतो.)

वरील ऋचेमध्ये ब्रह्मणस्पतीला गणांचा अधिपती म्हणजे प्रमुख अर्थातच गणपती असे संबोधले आहे. या ऋचेचा आधार घेऊनच अनेकांनी गणपती हा ऋग्वेदकालीही पूजनीय होता असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या मंडलापासून ऋग्वेदाचा प्रारंभ मानला जातो. अशा ऋग्वेदाच्या आरंभीच्या ऋचांमध्ये गणपतीचे आवाहन आल्यामुळे गणपतीच्या प्राचीनत्वाला अधिकच दुजोरा मिळाला आहे,असे प्रथमदर्शनी वाटते. पण येथे गणपती म्हणून ज्या देवतेला संबोधले आहे, ती देवता आहे ब्रह्मणस्पती. ब्रह्मणस्पती हे बृहस्पतीचेच एक नाव आहे. बृहस्पती गणसंस्थेचा पुरस्कर्ता व प्रख्यात लोकायत दर्शनाचा कर्ता होय. म्हणूनच चार्वाक अर्थात लोकायत दर्शनाला ‘ बार्हस्पत्य मत ’ असेही म्हणतात. लोकायत म्हणजे लोकांच्या हिताचा विचार प्रामुख्याने करणारा समूह. असे समूह आपले निर्णय परस्पर सामंजस्याने घेत व एकोप्याने राहत. अशा समूहांना गण ही संज्ञा होती. गणसंस्था ही अतिलोकशाहीवादी व्यवस्था होती हे जगातील बहुतांश समाजशास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे. ‘लोकायत’ या संशोधन ग्रंथांचे कर्ते देवीप्रसाद चटोपाध्याय यांनी ‘सर्वदर्शन संग्रह’ या माधवाचार्यांच्या ग्रंथाच्या आधारे हे सिद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे देवीप्रसाद चटोपाध्याय यांच्या ‘लोकायत’ या ग्रंथावर आधारित ‘लोकायत’ या आपल्या ग्रंथामध्येही डॉ.स.रा.गाडगीळ यांनी यावर अधिक प्रकाश टाकला आहे. ‘गणपती देवता’ या लेखामध्ये लो.बा.अणे यांनी गणसंस्थेवर विस्तृतपणे लिहिले आहे. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनीही त्यांच्या ‘प्राचीन भारतीय संस्कृती संवर्धन: ऐतिहासिक रूपरेषा’ या ग्रंथात गणसंस्थेला ‘प्राथमिक साम्यवादी समाज’ म्हणून संबोधले आहे. अशा गणांनाच व्रात, संघ, पूग इत्यादी संज्ञा होत्या. वैदिकांचे यज्ञयागादि कर्मकांड नाकारून व्रते करणारे ते व्रात्य व त्यांचा समुदाय म्हणजे व्रात होत असे एक मत आहे. परंतु व्रात्य हा शब्द कष्ट करणारे या अर्थाचा आहे,हे मनुस्मृतीतील उल्लेखावरून कळते. अशा समाजाला वैदिकांनी संस्कारच्युत, सावित्रीपतित या शब्दांनी संबोधले आहे. वैदिक आर्यांमधील संस्कारहीनांनाही ‘व्रात्य’ म्हणून प्राचीन काळी हिणविले जायचे. त्यांना स्वीकारायचे असेल तर,‘व्रात्यस्तोम’ या विधीने व्रात्यांना आर्यसंघात प्रवेश दिला जाई. अशारितीने आर्यसंघात प्रवेश घेणारा ‘गृत्समद’ हा पहिला अनार्य विद्वान. हा गृत्समद ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलाचा कर्ता आहे. अशारितीने ऋग्वेदाचा पहिला रचयिता गृत्समद गणसंस्थेचा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याने आपल्या जमातीच्या प्रमुखाला म्हणजेच गणाच्या अधिपतीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने ‘गणपती’ हा शब्द वापरला. असा या शब्दाचा खरा इतिहास आहे.

गणपती स्तुती व निंदा:

गणसमाजातील बरेच विद्वान व प्रतिष्ठित लोक तडजोडी करून आर्य समाजातील सदस्यत्व मिळवीत असत. त्यांच्यापैकी अनेकांनी वैदिक वाङ्मयाच्या निर्मितीतही सहभाग घेतला आहे. ऋग्वेदाच्या पाचव्या व सहाव्या मंडलातील ऋचांमध्ये (ऋ. ६-५६-५,५-४४-१२) गणांचे महात्म्य वर्णन केलेले आहे. अथर्ववेदात व वाजसनेयी संहितेत, गण, व्रात, संघ, पूग या संज्ञांचे सन्मानाने उल्लेख आलेले आढळतात. वैदिक आर्यांना गणसंस्थेबद्दल फारसा आदर नसला तरी त्यांच्या प्रभावाची जाण होती. त्यामुळे गण व गणपतीचा त्यांनी मुक्तकंठाने गौरव केला आहे. पण हा गौरव वैदिक समाजात समाविष्ट झालेल्या गणसमाजातील अनार्य ऋषींनी केलेला आहे, हे अधिक तपशिलात गेल्यावर दिसून येते. या गौरवामागे गण-व्रातांचे वाढते वैभवही कारणीभूत असावे. पुढे हे वैभव लुप्त झाल्यावर मात्र ब्राह्मण स्मृतीकारांनी गण व गणपतीची निंदा सुरू केली आहे. गणसंस्थेच्या विघटनानंतर राज्यसंस्था उदयास आली. लोकशाही व्यवस्थेविरूद्ध राजेशाही प्रस्थापित झाली. ही वर्गीय व्यवस्था ब्राह्मण स्मृतीकारांना प्रतिष्ठा देणारी होती. त्यामुळे तिचे गोडवे गाणे व गणसंस्थेची निंदा करणे त्यांना सोयीचे वाटू लागले. पण पुढे गणसंस्थेचा जनमानसात प्रभाव असल्याचे ध्यानात आल्यावर पुराणिकांनी गण व गणपतीची स्तुती करणे सुरू केले. पुराणनिर्मितीत शूद्रांमधील सूत, मागध, बंदी, चारण, कुशीलव इत्यादी जमातींचा बराच मोठा वाटा आहे. त्यामुळेच कदाचित पूर्वकालीन वैदिक अनार्यांप्रमाणे त्यांनी आपल्या आराध्य दैवताची स्तुती करणे स्वाभाविक आहे.

वेदांच्या संहिता व ब्राह्मण ग्रंथांमध्ये ‘गणपती’चा स्वतंत्र देवता म्हणून कुठेही उल्लेख नाही. गुप्तकाळामध्ये निर्माण झालेल्या ‘गणपती अथर्वशीर्ष’ या उपनिषदात गणपतीचे स्तवन आहे. वायुपुराणात शिवाला ‘लंबोदर’ गजेंन्र्दकर्ण अशा विशसेषणांनी संबोधले आहे. गणपतीचा शिवपुत्र म्हणून पुढे जो उल्लेख येतो, त्याचे मूळ या ठिकाणी सापडते. मराठी विश्वकोश , खंड 4 मध्ये हा संदर्भ देऊन म्हटले आहे की, “ रूद्र-शिव हा देव आर्य व आर्येतर अशा वेदकालीन भिन्न संस्कृतीच्या देवघेवीत निर्माण झाला. आर्येतरांच्या विविध प्रकारच्या मूर्तिपूजा व देवता यांचा समावेश होऊन आर्य व आर्येतरांची संस्कृती एकात्म बनू लागण्याच्या काळात, इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकांमध्ये, गणपती हा देव आर्येतरांच्या इतर देवतांबरोबरच, आर्यांनी स्वीकारला असावा. गजाचे मुख असलेल्या या देवाच्या अगदी प्राचीन अशा मूर्ती गुप्तकालीन आहेत, तत्पूर्वीच्या नाहीत ; हेही इ. स. पूर्व काळात गजानन हा देव आर्यपरंपरेत समाविष्ट झाला नव्हता याचेच सूचक आहे. आर्येतरांची गणपती ही हनुमानानप्रमाणेच ग्रामदेवता असावी.”

मूषकवाहन गणपतीचा अर्थ:

गणपतीच्या पायाशी उंदराची प्रतिमा आवर्जून आढळते. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे असे स्पष्ट म्हटले जाते, जुन्या मूर्त्यांमध्येही उंदरावर आरूढ झालेल्या गणपतीच्या मूर्त्या आढळतात. ग्रंथांमध्ये मूषकध्वज उंदरावर बसून चालत असलेल्या गणपतीची वर्णने आढळतात. ती वाचून किंवा तशा मूर्त्या पाहून विचार करणाऱ्या सामान्य माणसालाही प्रश्न पडतो की, आपल्या पायापेक्षाही छोटया आकारमानाच्या उंदरावर गणपती बसलाच कसा असेल ? पुराणाचे श्रोते सामान्य माणसेच होती. त्यांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेला साजेशी उत्तरे पुराणकारांनी दिली आहेत. आजही जेव्हा समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत,तेव्हा सामान्य माणूस गोंधळात पडतो. अशावेळी प्रतिकात्मक उंदराची काव्यात्मक उत्तरे देऊन तथाकथित विद्वान त्याला अधिकच संभ्रमात टाकतात. त्या साऱ्या उत्तरांचा येथे उल्लेख करीत नाही. पण संशोधनाने प्राप्त झालेली माहितीच पुढे वाचकांपुढे मांडत आहे.

गणसंस्था ही आदिम समाजरचना होती. आदिमांच्या समाजात टोळयांची विशिष्ट चिन्हे असतात. त्याला कुलचिन्ह (Totern) म्हणतात. ‘टॉटेम ॲनड टॅब्युज ’ या आपल्या शोधग्रंथात सिमंड फ्राईडने या कुलचिन्हांच्या निर्मितीमागील मानसशास्त्रीय कारणे दिलेली आहेत. जगभरातल्या आदिम समाजात अशी चिन्हे होती. ती पशुपक्षी, वृक्ष, हत्यारे इत्यादींची होती. आजही राजकीय पक्ष आपले चिन्ह मोठया दिमाखाने मिरवतात. तशी या आदिम जमातींमध्ये आपले चिन्ह समारंभप्रसंगी मिरवण्याची रीत होती. गणांनाही अशी चिन्हे असत. गणांची हत्ती, वाघ, अस्वल, वानर, कोल्हा, कुत्रा, वड, पिंपळ, मानवी कवटी इत्यादी चिन्हे होती. यापैकी “ गजानुयायी लोक हत्तीचे रूपडे करून आपल्या तोंडावर घालीत व अशारितीने आपले गजानुयायित्व लोकसमोर प्रगट करीत असे मला वाटले ” हे लो. अणे यांनी आपल्या ‘गणपतिदेवता’ या शोधनिबंधात नमूद केले आहे. डॉ.स.रा.गाडगीळांनी याविषयी विस्ताराने माहिती देऊन मातंग वंशाची सत्ता बुद्धकालात उत्तर भारतावर होती असे म्हटले आहे. मातंग म्हणजेच हत्ती व आपल्या हत्ती या कुलचिन्हाने हा गण ओळखला जायचा. ते याबद्दल लिहितात-
“ खारवेलच्या राणीने स्वत:चे वर्णन हस्तिसह अथवा हस्तिसिंह यांची कन्या असे केले आहे. हस्तिगुंफा लेण्यातील शिलालेख अद्यापि पूर्णपणे वाचता आलेला नाही. पण डॉ.जयस्वाल यांनी या लेखातील एक ओळ लाविली आहे. तिचा आशय असा- “ खारवेलच्या राजाने मूषिकांचा पराभव करून मूषिकांच्या राजधानीचा नाश केला ”. हस्तिगुंफा लेणे, हस्तिवंशातील राजा आणि मूषकांचा पराभव या घटना एकत्र घेतल्यास आजच्या गणपतीचे वाहन जो ‘मूषक’ त्याचेही रहस्य उलगडते. दुसऱ्या एका गणाचे टॉटेम ‘मूषक’ हे होते. या गणाचा हत्ती या गणाने पराभव केला व राज्यसत्ता स्थापन केली. साहजिकच जित लोकांचे टॉटेम जेत्यांच्या टॉटेमचे वाहन बनले. ही केवळ कल्पना नव्हे. महाभारतात मूषक लोकांचे वर्णन आहे. ॲलेक्झांडरबरोबर आलेल्या ग्रीक लेखकांनी ज्यांचे वर्णन केले आहे ते लोक जर मूषक असतील तर त्यांच्या सामूहिक गण जीवनाचे उद्बोधक वर्णन आपणास वाचावयास मिळते. विंध्यप्रवर्ताच्या प्रदेशात मूषक लोक असल्याचा उल्लेख पुराणांतररी आढळतो. तेव्हा गुप्तकालीन गणपतींनी मूषकगणाला पराभूत करून राज्यसत्ता प्रस्थापित केल्याचा निश्चित पुरावा आज जरी उपलब्ध नसला, तरी हस्तिगण, मूषकगण एकेवेळी भारतात होते, कोणीतरी हस्तीगणाने मूषकगणाचा पराभव केला; इतकी माहिती शिलालेखाच्या आधारे निश्चितच मिळते. हस्तिमुखाच्या गणपतीने मूषक हे आपले वाहन बनवावे या घटनेमागे वरील हस्ति-मूषक संघर्षच असावा आणि त्या संघर्षात हस्तिगण विजयी झाला असावा एवढे अनुमान काढावयास हरकत नाही.” डॉ. गाडगीळांचा हा निष्कर्ष पाहता गजाननाच्या मूषकवाहनाचा अर्थ स्पष्ट होतो.

सरते शेवटी:

गेल्या दीड हजार वर्षापूर्वी दैवतरूपात पूजनीय ठरलेल्या गजमुख गणपतीचे महात्म्य वर्णन करणारी गणेश पुराण व मुद्गलपुराण अशी दोन स्वतंत्र उपपुराणे महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी रचली आहेत, असे संशोधकांचे मत आहे. या पुराणांमध्ये वर्णिल्यानुसार विघ्नहरण करणाऱ्या गणपतीची उपासना वाढू लागल्यावर इ.स.पाचवे ते नववे शतक या दरम्यान ‘ गाणपत्य संप्रदाय ’ उदयास आला व प्रस्थापित झाला. पुढे तंत्रमार्गी लोकांनीही गणपतीला पूजास्थानी मानले. तंत्र म्हणजे तनाशी अर्थात शरीराशी आणि शेतीशी संबंधित. तांत्रिक हे वामाचारी होते असे उल्लेख प्राचीन वाङ्मयात सापडतात. वामा म्हणजे स्त्री. वामाचारी म्हण्जे स्त्रीसंबंधाला व विशेषत: स्वैरसंबंधाला प्राधान्य देणारे. तांत्रिक मार्गात मद्यपान, स्वैरमैथुन इत्यादी आचारांना पूजेचे अंग मानले आहे. पेशवाईच्या अखेरीस उच्चपदास पोचलेल्या काही ब्राह्मण जहागिरदार व सरदारांमध्ये वाममार्गी ‘गणेशतंत्र’ चालत असे, हे पेशवाईच्या इतिहासावरून दिसते. पेशव्यांचे दैवत गणपती होते,त्यामुळे पुण्याच्या आसपास असलेल्या गावांमधील गणपती मंदिरांची अष्टविनायकांमध्ये गणना झाली.

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव अधिक प्रमाणात प्रसारित केल्यामुळे गणपती अधिक मोठया जनसमुदायापर्यंत पोचला. वैचारिक व राजकीय प्रचाराचे साधन म्हणून गणेशोत्सवाचा वापर त्यावेळी झाला. आज गणांचा अधिपती गणेश नवनव्या रूपात जागोजागी आढळतो. त्याच्याशी थट्टा केली तरी तो काही कोपत नाही, अशी सर्वांचीच समजूत असल्यामुळे त्याला कधी-कधी गंमतीचा विषयही बनविले जाते. अशीच एक गंमत २१ सप्टेंबर १९९५ रोजी देशभर व देशाबाहेरही केली गेली. गणपतीला दूध पाजण्याचा उपक्रम योजनाबद्धरितीने पार पाडला गेला. एस.टी.डी. पी.सी.ओ. टेलिफोन केंद्राचा वापर, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी माध्यमेही याकामी सर्रासपणे वापरली गेलीत. गेली दीड हजार वर्षे ज्या गणपतीला दुर्वा व मोदकांवर समाधान मानावे लागले, त्या बिचाऱ्याला नव्याने दूध या स्निग्ध पदार्थांची चव जबरदस्तीने दिली गेली. या घटनेचा फायदा तथाकथित तांत्रिक चंद्रास्वामी याने घेऊन या साऱ्या तथाकथित दैवी चमत्कारामागे आपलाच हात असल्याची थाप मस्तपैकी ठोकून दिली.
गणपती देवतेच्या उगमापासून तो तिच्या विकासाची अशी ही चिकीत्सा. खरे तर हा एखाद्या शोधप्रबंधाचाच विषय ठरावा. पण लेखाच्या आवाक्याबाहेरचा तपशील याठिकाणी टाकता येणे शक्य नव्हते. त्याचप्रमाणे अधिक विश्लेषणालाही फार वाव नव्हता. हे लक्षात घेऊन वाचकांनी आपल्या शंका निरसनासाठी सारे सदंर्भ मुळातूनच पहावेत हे येथे सुचवावेसे वाटते.

-डॉ.अशोक राणा, यवतमाळ.

संदर्भ :
१) ऋग्वेदाचे मराठी भाषांतर -म. म. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव.
२) गणपतिदेवता, “अक्षरमाधव’ मधील लेख – लो. बापूजी अणे.
३) लोकायत – डॉ. स. रा. गाडगीळ,लोकवाङ्मगृह,मुंबई
४) लोकदैवतांचे विश्व – डॉ. रा. चिं. ढेरे

विठोबा कुणाचा? – डॉ.अशोक राणा

 https://satyashodhak.com/to-whom-does-vitthal-belong/

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेला पंढरपूरचा पांडुरंग हा वारकऱ्यांचा प्राण आहे. संत शिरोमणी नामदेवांनी त्याला विठाई म्हणून संबोधून ते आपल्या जीवीचे जीवन आहे, असं म्हटलं आहे. खरं तर त्यांच्यामुळेच तो भारतभर पसरला व शिखांच्या गुरुग्रंथ साहिबचं अविभाज्य अंग झाला. ज्ञानदेवांनी कानडा विठ्ठलु कर्नाटकु म्हणून त्यांच्या मूळ स्थानाची खूण सांगितली. मग तो केवळ महाराष्ट्राचाच आहे, असं कसं म्हणता येईल?

असा विठोबा आपलं आराध्यदैवत असूनही कुणाचंही कुलदैवत नाही, असं इरावती कर्वे यांनी म्हटलं आहे (महाराष्ट्र: एक अभ्यास, पृ. ११). अर्थात, ते अतिशय कमी लोकांचं कुलदैवत आहे, असं त्या म्हणतात. ‘ खुद्द विठ्ठलाची पूजा करणारे सहा- सात तऱ्हेचे लोक तिथे आहेत. बडवे, डिेंग्रे, दिवटे, पुजारी, बेणारे वगैरे त्यांच्यापैकी कोणाचंही विठ्ठल हे कुलदैवत नाही,’ असं त्यापुढे त्या म्हणतात. ‘ तेव्हा ज्याअर्थी कुलदैवत नाही त्या अर्थी इथल्या मूळच्या लोकांचा तो देव नसावा,’ अशी शंका त्यांनी १९७१ मध्ये प्रकाशित उपरोक्त पुस्तिकेत व्यक्त केली. १९७४ मध्ये प्रकाशित ‘कुलदैवत’ या डॉ. सरोजिनी बाबर यांनी संपादन केलेल्या व महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथातही विठोबाला स्थान नाही. त्यातून इरावतीबाईच्या मताला पुष्टीच मिळाली आहे. मग हा विठोबा कुणाचा आहे ? वारकऱ्यांचा की बडव्यांचा ? जैनांचा की बौद्धांचा, शैवांचा की वैष्णवांचा ? रुक्मिणीचा की राधेचा ? लखुबाईचा की पुंडलिकाचा ? पंढरपूरचा की माढ्याचा ? कर्नाटकांचा की महाराष्ट्राचा ? या साऱ्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्यात विद्वान संशोधकाच्या तीन पिढ्या राबल्या. पण त्याची जाणीव कुणाला आहे ? श्रद्धाळू वारकऱ्यांना त्याचा मागमूसही नाही. आषाढी–कार्तिकी एकादशी आली की, त्याची पावले आपसूकच पंढरीची वाट चालायला लागतात. ज्ञानबा-तुकारामच्या गजरात सारा आसमंत निनादून उठतो. गावंच्या गावं विठोबाच्या ओढीने जागी होतात. ही सारी किमया कशाची, हा एक प्रश्नच आहे. या प्रश्नातूनच वर्षोनुवर्षे अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. त्यापैकी एक प्रश्न आहे-

विठोबा वारकऱ्यांचा की बडव्यांचा?

नियमितपणे येरझारा करणे म्हणजे वारी व ती करणारा तो वारकरी. अशा अनेक देवतांच्या उपासकांमध्ये आपल्या इष्ट देवतेच्या भक्तासाठी वारी करण्याची परंपरा आहे. पण विठोबाच्या भक्तांची संख्या व त्याचा भक्तिभाव उठून दिसणारा असल्यामुळे प्रामुख्याने पंढरपूरच्या विठोबाच्या भक्तांना वारकरी असं म्हणतात. त्याच्या वैशिष्टयपूर्ण भजन व किर्तनाच्या पद्धतीमुळे त्याला संप्रदायाचं स्वरूप प्राप्त झालं व त्यातून वारकरी संप्रदाय निर्माण झाला. आषाढी एकादशीला या संप्रदायात अतिशय महत्व आहे. कारण की या दिवशी त्यांचं आराध्यदैवत विठोबा विष्णू झोपी जातो. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. चार महिन्यांनी तो उठतो, त्या दिवसाला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. मधला काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. चातुर्मास्यात विवाहासारखे मंगलकार्य करायचे नसतात. त्यामुळे चातुर्मास्यापूर्वीचा व नंतरचा काळ वारकऱ्यांच्या दृष्टिने महत्वाचा आहे.

वारकरी संप्रदायात तुळशीच्या माळेला महत्वाचं स्थान आहे. ही माळ घालणारा तो माळकरी. गावामध्ये त्याच्याकडे मोठया आदराने पाहिलं जातं. कारण एकदा माळ घातली की, साऱ्या व्यसनांपासून तो मुक्त होतो. विशेषत: मांसाहाराचा त्याग करून तो पूर्णपणे शाकाहारी झालेला असतो. सदाचाराचं महत्व मानवी जीवनात बिंबवणारा असा हा वारकरी संप्रदाय अतिशय लोकप्रिय व निरुपद्रवी समजला जातो. या संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचं स्थान महत्वाचं आहे, परंतु नामदेवापूर्वीही वारीची परंपरा चालू होती. यावरून जनमानसात ठाण मांडून बसलेली ही परंपरा बरीच जुनी असली पाहिजे, हे स्पष्ट होतं. आंध्र व कर्नाटक या शेजारच्या राज्यांमधूनही वर्षानुवर्षे वारकरी पंढरपूरला येतात. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद वारकरी संप्रदायाला मान्य नाही. त्यामुळे अठारापगड जातीचे संत यात उदयाला आलेत. भेदाभेद हा एक भ्रम असून तो अमंगळ आहे, असं संत तुकोबारायांनी म्हटले आहे. त्यातून समतेचा संदेश सगळीकडे पोहोचला. पण ही समता केवळ मंदिराच्या आतच होती. बाहेर निघाल्यावर जातीपातीच्या भिंती कायमच होत्या. त्यामुळे साऱ्या वारकऱ्यांची माऊली विठोबा असतानाही तिची लेकरं मात्र भेदभाव पाळत असत. आजही तीच स्थिती होती. त्यामुळे वारकरी संतांनी उच्च आदर्श व उदात्त हेतू प्रस्थापित केला असला, तरी तिला अभिप्रेत असं सामाजिक परिवर्तन घडून आलं नाही. याउलट वर्णव्यवस्थेचं समर्थन आजही वारकरी करतात. त्यामुळे त्यांचा विठोबा वारकरी संप्रदायाशी सुतराम संबंध नसलेल्या उत्पात– बडव्यांचा ताब्यात गेला. त्याविषयी वीस वर्षे वारकरी कीर्तन केलेल्या पंडित का. शि. संकाये यांनी पुढील विधान केलेलं आहे. ते म्हणतात-

‘ पुंडलिकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत विठ्ठलाचे पुजारी ब्राह्मण बडवे नव्हते. विठ्ठलाचे पुजारी बडवे हे मूळचे कर्नाटकातील आहेत. ते पंधराव्या शतकात पंढरपूरला आलेले आहेत. हे बडवे पंढरपूरला यायच्या अगोदर विठ्ठलाचे पुजारी कोण होते, याचा आजपर्यंत तरी शोध लागलेला नाही.’ (वारकरी पंथ शैवपंथ आहे, वैष्णवपंथ मुळीच नाही, पृ. १२) पंरतु संत चोखामेळा या तेराव्या शतकातील संताला बडव्यांनी मारल्याचा उल्लेख त्यांच्या अभंगात आहे. (बडवे मज मारिती, काय असा अपराध) त्यावरून तेराव्या शतकात या मंदिरावर बडव्यांचा ताबा होता, हे दिसून येतं.

बडवे हटाव मोहीम भारत पाटणकर व त्यांच्या सहकारी चळवळ्या लोकांनी सुरू केली होती. पण जिथे मुख्यमंत्र्यांनी विठोबाला अर्पण केलेला रत्नहार पळवायलाही बडवे भीत नाहीत, तिथे पाटणकरांच्या बडवे हटाव मोहिमेने बडव्यांच्या पोटातलं पाणी कसं हलणार ? पांडुरंगाच्या तीर्थकुंडात मुतायलाही जे मागेपुढे पाहात नाहीत, त्यांचं वाकडं कोण करणार ? पुरता विठोबा बडवांच्या ताब्यात गेला होता. जोपर्यंत वारकऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात उठाव करण्याइतपत हिम्मत येत नाही, तोपर्यंत विठोबा बडवे आणि कंपनीच्याच ताब्यात राहणार आहे ; असे अनेकांना वाटत होते. परंतु चाळीस वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला यश येऊन शेवटी विठोबा बडव्यांच्या ताब्यातून मुक्त झाला. आज पंढरपूरचे पुजारी शासन नियुक्त असतात. त्यामुळे कोणत्याही जातीच्या योग्य व्यक्तींना पुजारीपणाची जबाबदारी दिली जाते. एका महिलेलाही हा सन्मान त्यामुळे मिळालेला आहे. बडव्यांच्या ताब्यात येण्यापूर्वी तो कोणकोणत्या लोकांच्या ताब्यात होता, याचा इतिहास मात्र संशोधकांच्या प्रयत्नांनी उपलब्ध झाला आहे, तो असा-

बुद्ध-विठ्ठल : अनुबंध

विठ्ठल हा मुळात बुद्धच आहे, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ठाम मत होतं. या विषयावर त्यांनी एक ग्रंथच लिहायला सुरुवात केली होती. पण तो ग्रंथ पूर्ण झाला नाही. त्यातील त्यांचं मत संक्षेपाने असं होतं की- ‘पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती मुळात बुद्धाची मूर्ती आहे. यावर मी एक प्रबंध लिहीत आहे व तो पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळापुढे वाचला जाईल. पांडुरंग हा शब्द पुंडरीक या शब्दापासून निर्माण झाला आहे. पुंडरीक म्हणजे कमळ व पाली भाषेत कमळाला पांडुरंग असं म्हणतात. यावरून स्पष्ट होतं की, पांडुरंग म्हणजेच बुद्ध आहे, दुसरा कुणीही नाही.’ (धनंजय कीर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पृ. ५०१)

डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनीही विठोबा बुद्ध असल्याबद्दल अनुकूल मत व्यक्त केलं आहे. जॉन विल्सनच्या ‘ मेमोयरस ऑन् दी केव्ह टेम्पल ‘ या ग्रंथात विठ्ठल मंदिर बुद्धाचं होतं, असं म्हटल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (अ.रा. कुलकर्णी, धर्मपद, पृ. १२९)

डॉ. के जमनादास यांनी विविध वाङ्मयीन व पुरातत्वीय पुराव्यांचा संदर्भ देऊन विठ्ठलाची मूर्ती ही मुळातील बुद्धमूर्ती होय, हे पटवून दिलं आहे. ते म्हणतात, ‘ पंढरपूर के देवता बुद्ध है और अन्य कुछ नही, ऐसी महाराष्ट्र में गहरी परम्परा पुरातन काल से चली आ रही है. और महाराष्ट्रीय जनमानस में जम गई है. हमारे बचपन में, प्राथमिक पाठशाला में मुलाक्षर और अंको का जो किताब होता था उस में दशावतारों के चित्र होते थे. नववा अवतार बुद्ध काय दर्शाया जाता था. और जो चित्र था वह अजिंठा या एलोरा आदि से बुद्ध या बोधिसत्व का न होकर पंढरपूर के विठ्ठल का होता था. विठोबा यह बुद्ध ही है ऐसी गहरी मानसिकता महाराष्ट्रीय जनमानस में बसी थी, यह बात इससे स्पष्ट होती है.’ (तिरूपती बालाजी एक प्राचीन बौद्ध क्षेत्र, पृ. २३)

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी विठोबाच्या मूर्तीसंबंधी सखोल संशोधन करून ‘श्री. विठ्ठल : महासमन्वय’ हा ग्रंथ निर्माण केला आहे. त्यातही विठ्ठलाकडे बुद्ध म्हणून मराठी संतांनी पाहिलं होतं, हे अनेक पुराव्यांनी सिद्ध केलं आहे. नामदेवाची शिष्या जनाबाई म्हणते-
होऊनीया कृष्ण कंस वधियेला । आता बुद्ध झाला माझा सखा ॥ (३४४)
संत एकनाथ महाराजांनाही विठ्ठल बौद्धरूप आहे ; असं वाटत होते. ते म्हणतात–

नववा बैसे स्थिररूप । तया नाम बौद्धरूप ॥
बौद्ध अवतार घेऊन । विटे समचरण ठेवून
पुंडलिक दिवटा पाहून । तयाचे द्वारी गोंधळ मांडिला ॥
बया दार लाव । बौद्धाई बया दार लाव ॥ ३९११॥
संत शिरोमणी नामदेव महाराजही म्हणतात –
गोकुळी अवतारु सोळा सहस्रां वरु ।
आपण योगेश्वरु बौद्धरूपी ॥ (१५०३)
व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
झाला दिगंबर अवनिये ॥(१०९६)
ऐसा कष्टी होऊनि बौद्ध राहिलासी । (१०९८)

संत तुकोबारायांनाही विठ्ठल बुद्ध वाटला म्हणून ते म्हणतात-

बौद्ध अवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखे निष्ठा धरियेली ॥

याशिवाय अनेक संत व महंतांनी विठ्ठलाला बुद्ध म्हटल्याचं डॉ. ढेरे यांनी दाखवून दिलं आहे. पूर्वी पंचांगांवर दशावतार चित्रं राहायची तेव्हा त्यात बुद्धाच्या ऐवजी विठोबाचं चित्र असायचं. पण त्याखाली बुद्ध वा बौद्ध असं लिहिलेलं असे. या सर्व पुराव्यावरून डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात, ” ज्ञानदेव–नामदेवांच्या काळात निकटपूर्वी सतत हजार–दीड हजार वर्षे सारा महाराष्ट्र भगवान बुद्धाच्या अनुयायांनी व्यापलेला होता…. भिक्षू हा आदराचा विषय बनलेला होता. त्या आदराची निदर्शक म्हणून भिकोबा अन् भिकुबाई ही स्त्री–पुरुषांची नावं खेडोपाडी प्रचलित झालेली होती……. ज्ञानोबा–तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करुणेचा महापूर महाराष्ट्रभर पसरवला, त्या इंद्रायणीचा उगम तथागताच्या करुणामय जीवितातून स्फूर्ती घेणाऱ्या असंख्य भिक्षूंच्या निवासभूमीत झालेला आहे, हे सत्य सहजी डावलता येण्यासारखं नाही…….आणि म्हणूनच मला असं नि:संकोचपणाने म्हणावसं वाटतं की, महाराष्ट्रात हजार-दीड हजार वर्षापर्यंत नांदलेल्या भगवान बुद्धाने आपल्या हृदयातील करुणेचा कमंडलू बाराव्या-तेराव्या शतकात जाता-जाता इथे उपडा केला अन् मग त्याची धारा धष्टपुष्ट होऊन वाहती राहण्यासाठी संतांनी आपल्या भावभक्तीचे अनेकानेक प्रवाह तिच्यात मिळविले. महाराष्ट्रात तरी कालक्रमाने आलेले तांत्रिक विकृतीसारखे आपल्यातील सारे हीन दूर दवडून बौद्ध धर्म भागवत धर्माच्या रुपाने पुन्हा अवतरला….. बौद्ध हा नवा भागवती अवतार म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातलं वैचारिक पातळीवरचं एक महान युगांतर आहे.’ (पृ. २३५)

जैनांचा देव विठ्ठल:

‘वरील ग्रंथातच ‘विठ्ठल आणि जिन’ या लेखात पंढरीचा विठ्ठल हा जैनांचा देव आहे, असा जैनांचा दावा बहुधा अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत उच्चारला जात असावा, असं मानायला जागा आहे ’ असं डॉ. ढेरे म्हणतात. त्रिपुटीच्या गोपाळनाथांचे शिष्य गोविंदनाथ(शके १६४३-१७३३) यांनी आपल्या अभंगात मात्र या दाव्यांचं खंडन केलं आहे, ते असं–

‘पंढरीचा देव म्हणती जैनांचा । तया गाढवाचा जन्म वृथा ॥‘

पद्मपुराणात पांडुरंगाला बाळ दिगंबर म्हटलं आहे. यातील दिगंबर शब्द जैनवाचक आहे, असं वाटून जैनांनी विठ्ठलाला नेमिनाथ रूपाने मानण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता, तसंच खंडोबालाही आपलासा केला होता, असं डॉ. ढेरे म्हणतात (पृ. २४०) रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी ‘भरत–खंडाचा अर्वाचीन कोश’ या ग्रंथात पुंडलिकाविषयी जे टिपण लिहिलं आहे, त्यातून जैनांचा विठ्ठलावरील दावा कसा होता याची कल्पना येते.

ते म्हणतात– ‘पुंडरिक हा जातीचा ब्राह्मण होता व मोठा विद्वानही होता. जैन लोक असं म्हणतात की, युधिष्ठिर शके १७२४ मध्ये विद्यारत्नाकर नावाच्या एका जैन पंडिताशी याचा वाद होऊन त्यात त्याचा पराभव झाला व हा जैनधर्म स्वीकारून अहिंसा धर्माप्रमाणे आचरण करू लागला. हा वाद भीमरथीच्या तिरी म्हणजे भीमा नदीच्या काठी असणाऱ्या लोहदंड क्षेत्रात झाला व त्या वेळेला चंद्रगुप्ताचा मुलगा व अशोक राजाचा बाप वारिसार याची कारकीर्द होती. जर ही वर लिहिलेली गोष्ट खरी असेल, तर या गोष्टीस आज गतकलीच्या ४९८० व्या वर्षी ३१५६ वर्षे झाली आहेत, असं म्हटलं पाहिजे; परंतु यास आणखी काही प्रमाण मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळाल्यास मग याचा निर्णय न्यायाचं होणार आहे. इतकं आम्हास येथे लिहिण्याचं कारण असं आहे की, युधिष्ठिर शक १७२५ विरोधकृत संवत्सरी आषाढ शुद्ध ११ बुधवारी त्या जैन पंडिताने जी मूर्ती स्थापली, तिच्या आकृतीचं वर्णन असं केलेलं आढळतं–

नेमीनाथस्य या मूर्तिस्त्रिषु लोकेषु विश्रुता ।
द्वौ हस्तो कटिपर्याये स्थापयित्वा महात्मन: ॥१॥
मूर्तिस्तिष्ठति सा सम्यक जैनेंद्रेणच पूजिता ।
अहिंसा–परमं धर्म स्थापयामासा वै स च ॥२॥
युगैस्तु मनुजाक्षीणि विप्रभूमिश्च वामके ।
मेलने धर्मराजस्य शकस्यच गतावधी: ॥३॥
आषाढे शुक्लपक्षे तु एकादश्यां महातिथौ ।
बुधे च स्थापयामास विरोध कृतीवत्सरे ॥४॥ (जैनग्रंथ)

हे वर्णन हल्ली जी पंढरीस विठ्ठलमूर्ती आहे, तिच्या आकृतीशी जमतं. मात्र, काळाचा मेळ पडत नाही. कारण नामदेवांनी लिहिलेल्या आरतीत हा देव अठ्ठावीस युगांचा आहे, तर जैन सुमारे साडेबत्तीसशे वर्षाचा म्हणतात. म्हणून यास बलवत्तर दुसरं प्रमाणच मिळालं पाहिजे. त्याशिवाय याचा निर्णय होणं नाही. सारांश, पुंडरिक पंडित प्रल्हाद–नारद-पराशर–पुंडरिक या श्लोकात लिहिलेला तोच हा, असं तूर्त म्हणता येत नाही. डॉ. ढेरे पुढे म्हणतात की, ‘गेल्या शतकाच्या अखेरीस आपला कोशग्रंथ सिद्ध करताना गोडबोले यांनी कोणत्याही जैन ग्रंथांच्या आधारे ही माहिती आणि हे श्लोक उद्ध़ृत केले ते सांगता येत नाही. आषाढी शुक्ल एकादशी, बुधवार, अहिंसा धर्म, कटीन्यस्तकर हे सर्व उल्लेख विठ्ठलोपासना आणि विठ्ठलमूर्ती यांच्याशी जुळणारे असे आहेत. अर्थातच ऐतिहासिकदृष्टया ते खरे–खोटे ठरवण्यात अर्थ नाही. जैन परंपरा विठ्ठलाला नेमीनाथ म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न कशाप्रकारे करीत होती, हे समजावून घेण्यासाठी या माहितीचं आणि या श्लोकांचं महत्व आहे, एवढंच आपण ध्यानी घ्यायला हवं.

प्रख्यात इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी विठ्ठलावर हक्क सांगणाऱ्या जैन लोकांच्या समजुतीविषयी म्हटलं आहे की, ‘ पंढरपूरच्या मूर्तीविषयी आणखी एक प्रवाद आहे. या प्रवादाचा उल्लेख इंडीयन अँटिक्वेरीच्या दहाव्या भागात (पृ. १४९) आला आहे. हा लेख एका मिशनऱ्याने उपहासबुद्धीने लिहिला असून, हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते; आता हिंदूंचे झाले; सध्या येथे ७५ जैन असून ते विठोबाची मूर्ती आपली देवता आहे असे म्हणतात. इत्यादी अर्थ त्यात आहे. या लिहिण्यावरून त्याचा झोक ही मूर्ती जैनांची आहे, असं म्हणण्याचा दिसतो. तसंच तेथील जैनांना विठोबाच्या संस्थानातून काही मानमरातब चालू असल्याची माहिती लागते. एवढंच नव्हे, तर ती मूर्ती जैन नेमिनाथ तीर्थंकरांची आहे, असंही एका जैन ग्रंथात प्रतिपादन केल्याचं गोडबोलेंच्या कोशावरून समजतं.’ यावर डॉ. ढेरे म्हणतात, ‘ ग. ह. खरे हे प्रवाद आणि धारणा यातील अंतर ध्यानी न घेता लिहीत आहेत. देवतांच्या उन्नयनप्रक्रियेला, त्यांच्या प्रतिष्ठेच्या चढ-उताराला, त्याविषयीच्या लोकमानसातील श्रद्धेच्या उत्थान–पतनाला कारण होणाऱ्या धारणा अगदीच तथ्य नाही, अशा ठोकळ शेऱ्याने उडवून लावून चालणार नाही….. ते विठ्ठल हा आपलाच नेमीनाथ आहे, असं मानू लागतात/म्हणू लागतात, तेव्हा त्यांना विठ्ठल हा नेमिनाथाच्या रुपात उन्नत करून आत्मसात करायचा असतो.’

विठ्ठलाला सर्वांनी आपलंच मानलं आहे. तो आज विष्णूचं एक रूप म्हणून प्रचलित असला, तरी शैवांनीही त्यावर वारंवार हक्क सांगितला आहे. म्हणून प्रश्न पडतो की-

विठोबा शैवांचा की वैष्णवांचा?

पंडित का शि. संकाये यांनी तर वारकरी पंथ शैवपंथ आहे असं सिद्ध करणारं त्याच शीर्षकाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘ विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे. भस्म लावण्यासाठी कपाळ उंच आणि रुंद असून गळयात जानवे नाही. शिव मंदिरात एक शिवलिंगच असते, त्याप्रमाणे विठ्ठल मंदिरात एकटाच आहे. शिवाच्या दर्शनाला विश्वारंभापासून ते आतापर्यंत कोणालाही बंदी नाही. त्याप्रमाणेच विठ्ठलाच्या दर्शनाला कोणाला बंदी नाही….. पंढरपूर हे जुने शिवपीठ आहे. शिवक्षेत्र आहे. येथेही पंढरपूर निर्माण झाल्यापासून ते आजपर्यंत विठ्ठलासह अनेक शिवमंदिरे आहेत. आजही पंढरपूर शिवक्षेत्र, शिवपीठच आहे. विठ्ठल ही देवता वीरशैव आहे आणि त्याचे भक्त पुंडलिक, नामदेव, तुकाराम आदि संत व वारकरी समाज शैव आहे.’ या अवतरणात विठ्ठल ही देवता वीरशैव आहे असे संकाये यांनी म्हटले आहे. अलीकडे त्याऐवजी लिंगायत हा शब्द वापरला जातो.

‘पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गा’ या विठ्ठल आरतीतील चरणातून पंढरपुरास विठ्ठलाला आणण्याचं श्रेय पुंडलिकाचं आहे, असे स्पष्ट झालं आहे. भीमेच्या पात्रामध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेऊनच भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. यावरून वारकरी संप्रदायामध्ये त्याचं स्थान किती महत्वाचं आहे हे दिसून येतं. प्राचीन इतिहासाचे प्रख्यात संशोधक प्रा. श्री. म. माटे यांनी ‘पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रुपांतर’ या लेखात वास्तवावर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, ‘ पुंडलिकाच्या देवळात पुंडलिकाची मूर्ती नाही. तेथे शिवाचं लिंग आहे आणि लिंगावर लोक पितळेचा मुखवटा घालतात. जर ती पुंडलिकाची समाधी आहे, तर पद्धतीप्रमाणे पादुका बसावावयास हव्या होत्या आणि त्या बसवलेल्या असत्या म्हणजे पुजाऱ्यांनी पितळेचा मुखवटा बसवला असता, असं वाटत नाही. तथापि, समाधीवर महादेवाचं लिंग बसवण्याची चालही आहे. आणि पुंडलिकाची समाधी ज्यांनी बांधली, त्यांनी या कल्पनेप्रमाणेच शिवलिंगाची स्थापना केली असेल. पण या ठिकाणी एक विकल्प मनात येतो. या पुंडलिकाच्या देवळातले पुजारी कोळी आहेत. अनेक ठिकाणी महादेवाची पूजा कोळयांच्याकडे असते. पूजेचा पहिला मान कोळयांकडे किंवा जंगमाकडे असून, त्यांच्यामागून ब्राह्मणांनी पूजा करावी, अशी चाल असते. पण ही चाल एखाद्या समाधीवर बसवलेल्या शिवलिंगाच्या बाबतीत नसावी; असं मला वाटतं. मग जर येथे केवळ पुंडलिकाची समाधी आहे आणि हे मूळचंच महादेवाचं स्थान नाही, तर येथली पूजा कोळयांच्याकडे कशी, या प्रश्नाचाही शोध करावा लागेल.

प्रा. माटे यांच्या या प्रश्नाच्या अनुरोधाने डॉ. ढेरे यांनी पुंडलिक मंदीर हे एक शिवमंदीर आहे, या गृहितकृत्याचा आधारे संशोधन केलं. भारतीय भक्तिसाहित्याच्या विदेशी (फ्रेंच) अभ्यासिका डॉ. शालोटे वोदविल यांनी पंढरपूर विषयक लेखात पंढरपूर हे विठ्ठलप्रभुत्वापूर्वी एक शैवस्थान होते, असं मत मांडलं आहे. त्यासाठी पंढरपुरातील अनेक नव्या–जुन्या शैव दैवतांच्या स्थानांचा पुरावा सादर केला आहे. या पुराव्यात त्यांनी पुंडलिकाचाही समावेश एक शैव स्थान म्हणूनच केला आहे.

याच दिशेने डॉ. रिसाइड व प्रा. धनपलवार यांनी संशोधन केलं. पण त्यापूर्वी डॉ. रा. गो. भांडारकर यांनी पंढरपूर हे प्रथम शैव क्षेत्र होतं, असं मत मांडलं होतं. पांडुरंग या शब्दाच्या अर्थावरून तसंच शिवरुपात पूजिला जाणाऱ्या पुंडलिकाला जो अग्रमान आहे, त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला. डॉ. पांडुरंगराव देसाई यांनी पांडुरंग म्हणजे शिव या लेखात (नवभारत,जून १९५७, पृ. १२-१४) शिलालेखातील नव्या संशोधनावरून या मताचा पुरस्कार केला होता. डॉ. ढेरे यांनी याकडे लक्ष वेधून म्हटले आहे की, ‘ धारवाड जिल्हयात हिरेकेरुरजवळ बाळंबीड नावाचं जे एक प्राचीन शिवस्थान आहे, तेथे असलेल्या कोरीव लेखात त्या स्थानाचं नाव पांडुरंगेश्वर असं आलं आहे. प्रा. धनपलवार यांनीही आंध्रातील नेल्लोर जिल्हयात पंडरंगम् हे स्थान आणि तेथील पंडरंगेश्वर याकडे लक्ष वेधलं आहे. (विठ्ठल म्हणजे शिव, माणिक घनपलवार, अनुबंध ५.२, अंक क्र. १८ जुलै ते सप्टेंबर १९८१, पृ २६-३४) वेंगीच्या चालुक्यांच्या सत्ताकाळात गाजत असलेलं हे शिवस्थान पंडरंग नामक एका सेनापतीशी संबंधित होतं. पांडुरंग आणि पुंडरिक ही दोन्ही नावं पंढरपूरच्या संदर्भात तरी पंडरंगे या ग्रामनामाचं संस्कृतीकरण करून साधलेली असल्यामुळे पांडुरंगाच्या आधारे पंढरपूरचा शैव महिमा सांगणारे संशोधक हे अप्रत्यक्षपणे पुंडरिकाकडे संकेत करणारे ठरतात, असं मला वाटतं.’ यावरून पांडुरंग हा शैवांचा होता हे स्पष्ट होतं. वैष्णवांच्या ताब्यात तो नंतर आला.

पांडुरंग म्हणजेच शिव – शंकर

पांडुरंग हा शब्द विठोबासाठी वापरण्यात येतो. पण ते पंढरपूरचं मूळ नाव आहे. पांडुरंग विठ्ठल या शब्दाचा विठ्ठल असा होतो. पंढरपूरला पांडुरंग क्षेत्र आणि पुंडरिक क्षेत्र/पौंडरी क्षेत्र या नावानेही प्राचीन ग्रंथांमध्ये संबोधलं आहे. पंढरपुरामध्ये सापडलेल्या शिलालेखांमध्येही तसंच पंढरपूरची माहिती देणाऱ्या कोरीव लेखांमध्ये पांडुरंगपूर, पौंडरीक क्षेत्र, पांडरी, पांडरीपूर असा पंढरपूरचा उल्लेख आढळतो. होयसळ वंशातील वीर सोमेश्वर यादवाच्या कोरीव लेखात कन्नड व संस्कृत या दोन्ही भाषांमध्ये पंडरंगे या शब्दाचा वापर केलेला आहे. तो कानडी भाषेतील असून त्यातूनच पांडुरंग, पांडुरंग क्षेत्र, पांडुरंगपूर, पौंडरिक क्षेत्र, पुंडरिक इ. शब्द तयार झालेत.

पंडरंगेऐवजी पांडुरंग हा शब्द वापरात आला व त्याचा अर्थ पांढऱ्या रंगाचा म्हणजेच शुभ्र असा होतो. शिवाचं वर्णन कर्पूरगौर भोळा, असं आरतीमध्ये करण्यात आलं आहे. त्याचा अर्थ कापरासारखा गौरवर्णीय म्हणजे शुभ्र असा होतो. शिवाची प्रतिमा श्यामवर्णीय सर्वत्र दिसत असली, तरी प्राचीन ग्रंथांमध्ये तो गोरा होता, असे उल्लेख आहेत. प्राकृत भाषेचा प्राचीन व्याकरणावर हेमचंद्र याने आपल्या देशीनाममालेत पंडरंगो रुद्दम्मि या शब्दातून पांडुरंग व रुद्रशिव हे एकच होत, असं स्पष्ट केलं आहे. यावरून पांडुरंग म्हणजेच शिव-शंकर होय, हे सिद्ध होतं. त्याचं महात्म्य ज्या ठिकाणी आहे, त्याला पांडुरंगपूर असं नाव प्राप्त झालं व त्यातून पंढरपूर या शब्दाची सिद्धता झाली. पांडुरंग या नावाप्रमाणेच विठ्ठल हे नावही शिवाचंच होय, असं प्रा. धनपलवार यांनी ‘विठ्ठल म्हणजे शिव’ या लेखात दाखवून दिलं आहे. त्यांच्या मते, भट्टीप्रोलू (जि. गुंटुर, आंध्र प्रदेश) येथील विठ्ठल मंदिर सर्वात प्राचीन असून येथील विठ्ठल दैवत प्रारंभापासून शिवदैवत होतं. अनेक ठिकाणी वीरभद्र या शिवाच्या रुपातही विठ्ठलाची पूजा केली जाते. आंध्रप्रदेशातील लेपाक्षी (जि. अनंतपूर) येथील मंदिरातील शके १९५९ च्या शिलालेखात वीरभद्राला विठ्ठलेश्वर म्हणून संबोधलं आहे. विठ्ठलाची प्राचीन मंदिरं ही शिवमंदिर असून विठ्ठल हा शब्द पांडुरंगशिव या अर्थानेच आंध्रप्रदेशातील प्राचीन शिलालेखांमध्ये वापरलेला आहे. तिरुवारूर आणि चिदंबरम् या दोन शिवक्षेत्रांचं पर्यायी नाव पुंडरिकपूर असं आहे व त्याच्याजवळच दिंडीरवन आहे. यावरुन पंढरपूर हे मूळचं शिवक्षेत्र असून विठ्ठल हा त्या क्षेत्रातील अधिष्ठाता देव शिव–शंकरच आहे, हे स्पष्ट होतं. म्हणून येथील दिंडीरवन व तेथील लखुबाईविषयी माहिती पाहणे आवश्यक आहे.

दिंडीरवनातील लखुमाई

पंढरपूरमध्ये दिंडीरवन या नावाने ओळखला जाणारा एक भाग आहे. हैदराबाद येथील प्रा. माणिक धनपलवार यांनी दक्षिणेतील तिरुवारूर या पौंडरिक क्षेत्रामध्ये (जे शिवक्षेत्र आहे) दिंडीरवन नावाचा प्रदेश असल्याचं आपल्या ‘विठ्ठल म्हणजे शिव’ या लेखात म्हटलं आहे. दींडीवन या ग्रामनामाने त्याचा उल्लेख होतो. त्याला तमिळमध्ये तिंडीवनम् असं म्हणतात. मद्रास-तंजावर लोहमार्गावर असलेलं हे गाव अजूनही शिवक्षेत्र आहे. पण पंढरपूरच्या दैवताचं शिवरुपात्व जाऊन त्याजागी वैष्णव मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, अशी खंत प्रा. धनपलवार व्यक्त करतात. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी मात्र त्याच्या या विधानाविषयी असहमती दर्शविली आहे. ‘दिंडीरवनाचे रहस्य’ लेखात ते म्हणतात (पृ. ६६) की, ‘पंढरपुरात विठ्ठल हाच पूर्वी शिव होता आणि नंतर विष्णू–कृष्ण बनला, असा पुरावा मात्र उपलब्ध नाही.’ पण प्रा. धनपलवार यांचे आभार त्यांनी यासाठी मानले की, त्यांच्यामुळे दिंडीवन या गावाची तसंच त्याला तमिळमध्ये तिंडीवन या नावाने ओळखलं जात असल्याची माहिती मिळाली.

तिंडीवनम् हा तिंत्रिणीवनम् या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असून त्याचा अर्थ चिंचबन असा होतो, असं ठाकुरदास जौहरी यांनी त्यांच्या ‘श्रीभारतवर्षीय दिगम्बर जैन यात्रार्पण’ या ग्रंथात म्हटलं आहे. त्यांचा संदर्भ घेऊन डॉ. ढेरे म्हणतात की, ‘चिंचेचे झाड संस्कृतात तिंतिड, तिंतिल, तित्तिडी, तिंतिला, तिंतिणी, तिंत्रिणी या नावानी ओळखलं जात. चिंचावृक्ष असाही संस्कृत शब्द वापरत आहे.’ यापासूनच तिंडीरवन, दिंडी आणि दिंडीरवन हे शब्द बनले आहेत. त्याचा अर्थ चिंचेच्या झाडांचं बन असा आहे, असं सांगून पुढे डॉ. ढेरे म्हणतात, ‘पंढरपूर येथे गावाबाहेर लक्ष्मीतीर्थाजवळ नदीकाठी दिंडीरवन या नावाचं एक स्थान आहे. यात भागात लखुबाईचे मंदिर आहे. या मंदिरातील लखुबाई नावाच्या या देवीचं मूळ रूप अनघड शेंदरी तांदळयाचं आहे आणि या तांदळ्यामागील उंच पीठावर स्थापन केलेलं तिचं मूर्तिरूप गजलक्ष्मीचं आहे. ही लखुबाई म्हणजेच कृष्णावर रूसून दिंडीरवनात येऊन राहिलेली रुक्मिणी होय, असं मानलं जातं. हिच्या अवतीभवती अजूनही पूर्वास्पृश्यांची वसती आहे, तरीही हिच्या पूजाआदींचा अधिकार उत्पात मंडळीकडेच आहे.

कोळ्यांच्या म्हसादेवीचं मंदिरही या लखुबाईच्या मंदिराजवळच आहे. ही रुसलेली रुक्मिणी (अर्थात लखुबाई) आजही ज्या दिंडीरवन नामक बनात नांदते आहे, हे बन चिंचेचं आहे, हे कोणाही यात्रिकाला स्वत:च्या डोळयांनी पाहता येईल. या बनात काल–परवापर्यंत चिंचेची सात मोठी झाडं होती. त्यांना श्रद्धेने सप्तर्षी मानलं जात असे. यापैकी एका झाडाचं खोड तर इतकं मोठ होतं की, ते कोरलं तर त्याच्या बोगद्यातून बैलगाडी पलीकडे जाऊ शकेल, अशा अतिशयोक्तीने त्याच्या प्रचंडतेचं वर्णन केलं जात असे. परंतु आता या प्रचंड झाडासकट चार चिंचेंची झाडं पंढरपूर नगरपालिकेने नगरविकास योजना राबवताना तोडून टाकली आहेत आणि फक्त तीन चिंचेची झाडं दिंडीरवनाचं नामरहस्य उलगडून सांगण्यासाठी साक्षी म्हणून जिवंत राहिली आहेत.’ हा लेख तयार करण्याच्या निमित्ताने मी स्वत: दिंडीरवन व तेथील झाडं पाहिलीत. दिंडीरवन हा शब्द चिंचेच्या झाडांच्या समूहाला उद्देशून वापरला गेला, हे वरील माहितीवरून स्पष्ट होतं. पण ही माहिती उजेडात येण्यापूर्वी या वनात दिंडीरव नावाचा राक्षस राहात होता. त्यामुळे त्याला दिंडीरवन असं म्हणतात, अशी लोकांची समजूत होती. त्यामुळे त्याला दिंडीरवन असं म्हणतात, अशी लोकांची समजूत होती. पद्मपुराणांतर्गत मानल्या जाणाऱ्या पांडुरंग महात्म्यात तशी कथा आहे. या दिंडीरव राक्षसाला मारण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचं रूप धारण केलं आणि लोहदंडाचा आघात करून त्याला मारलं, असं या स्पष्टीकरण कथेत म्हटलं आहे. पंढरपुरातील दिंडीरवन व लोहदंडक्षेत्र या स्थानांचं कृत्रिम संस्कृतीकरण करून ही स्पष्टीकरणकथा कल्पक भिक्षुकाने तयार केली असावी.

दिंडीरवनाशी संबंधित कथा तिरुपतीच्या बालाजीविषयीही प्रचलित आहे. विठ्ठलाची पत्नी राधेच्या रागावर रुसून दिंडीरवनात आली, तर वेकटेंश बालाजीची पत्नी भृगूने केलेला अपमान न साहवून चिडून प्रथम करवीरात, नंतर तिरुचानूरमध्ये राहिली. वेंकटेशाची पत्नी पद्मावती तर विठ्ठलाची प्रेयसी पद्मा. तीच पंढरपुरातील पदूबाई होय. तीच रुक्मिणी होऊन प्रकटली, असं पदुबाईचे धनगर भक्त मानतात. वेंकटेश चिंचेच्या झाडाखालच्या एका वारुळातून प्रकट झाल्याची कथा भविष्योत्तरपुराणांतर्गत वेंकटेश महात्म्यात आहे. चिंचेच्या झाडाचं महत्त्व येथेही आहेच. विठ्ठलवीरप्पाच्या कथेतही त्याचं महत्त्व आहे. या सर्व कथांचा परामर्श घेऊन डॉ. ढेरे यांनी दिंडीरवनातील लखुबाई ही विठ्ठल पंढरपुरात येण्यापूर्वीपासून येथे प्रतिष्ठित होती, असं म्हटलं आहे. (पृ. १८३) तिच्या गजलक्ष्मीच्या रुपातील मूर्तीचा रुक्मिणीशी अर्थाअर्थी काही संबंध नाही. तरीही ओढूनताणून लावला जातो.

लखुबाईचं पंढरपुरातील मंदीर पाहिल्यावर तिचा विठोबाशी काही संबंध असेल, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. कारण शेंदराने माखलेल्या तांदळ्याच्या अर्थात, दगडी अनघड (न कोरलेली) मूर्तीच्या स्वरुपात लखुबाई येथे पूजली जाते. तिच्यामागे उंच ओट्यावर काळ्या पाषाणात गजलक्ष्मीची कोरलेली मूर्ती बसवलेली आहे. त्यावरून तर स्पष्ट होतं की, ती रुक्मिणी नाही. पण तिच्या मागील भिंतीवर आपल्या उजव्या बाजूला रुक्मिणीला न्यायला कृष्ण आलेला आहे व तो रथात बसवून तिला घेऊन् जात आहे, असं उत्थित शिल्प (Relief Sculpture) बसवलेलं आहे. त्यालाही भरपूर शेंदूर लावलेला असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही. पण तेथील पुजारी ते शिल्प कृष्ण रुक्मिणीला रथात घेऊन जात असल्याचं आहे, असं सांगत असतो. हे पुजारी बडवे परिवारातील आहेत. त्यामुळे हे सांगण्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, हे स्पष्ट होतं. पण जेवढी गर्दी विठोबांच्या मंदिरात होते, तेवढी इथे होत नाही. कारण मुळातच लखुबाई ही धनगरांची समृद्धीची देवता आहे. शेळ्या, मेंढ्या, गुरे, ढोरे यांच्या संपत्तीचं प्रतीक अशी लक्ष्मीच लोकभाषेत लखुबाई म्हणून प्रचलित झाली आहे. तिच्या अवतीभवती मागासवर्गीयांची वस्ती आहे. लखुबाईच्या मंदिरासमोर नागाचं देऊळ आहे. यावरून नागपूजकांच्या संप्रदायाचा व त्यांच्या लोकमातेचा निर्देश होतो. नागपूजकांचा संप्रदाय हा शिव वा पार्वती पूजकांच्या संप्रदायात विलीन झाला. त्यामुळे शिव वा पार्वतीच्या मंदिरासमोर नागमंदीर असतं. पांडुरंग किंवा पुंडलिक ही देवता म्हणजे शिव होय. हीच पंढरपूरची मूळ ग्रामदैवत होय. तीच स्थिती लखुबाईचीही आहे. मुळातला विठ्ठल शिव आहे, हे अनेक विद्वानांनी सिद्ध केलं आहे. वैष्णवभक्तांच्या ताब्यात ही दैवतं आल्यानंतर त्याचं वैष्णवीकरण करण्यात आलं. याविषयी डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात, ‘ पंढरपुरात श्रीविठ्ठल या वैष्णव देवतांचं आगमन होण्यापूर्वी, म्हणजे श्रीविठ्ठल या वैष्णवी दैवताचा महिमा पंढपुरात वाढण्यापूर्वी तिथे ज्या प्रतिष्ठित व लोकप्रिय देवता नांदत होत्या, त्यांना विठ्ठल परिवारात समाविष्ट करण्यासाठी आणि शक्यतो त्यांचंही वैष्णवीकरण साधण्यासाठी ज्या कथा रचल्या गेल्या , त्यांचा समावेश स्थलपुराणात झालेला दिसतो. या वैष्णवीकरणाच्या व्यापक प्रयत्नातूनही मल्लिकार्जुन आणि पद्मावती ही दोन दैवत आपलं मूळचं स्वतंत्र रूप पूर्णत: राखून राहिली; परंतु दिंडीरवनातील लखुबाई आणि भीमेच्या पात्रातील पुंडलिक ही दोन दैवत मात्र दर्शनदृष्टया आपल्या स्वतंत्र, मूळच्या रुपात टिकली असली, तरी चरित्रदृष्टया मात्र ती पूर्णत: वैष्णव बनली आहेत- लखुबाई ही रुसलेल्या रुक्मिणीचं चरित्र स्वीकारुन नांदते आहे; तर पुंडलिक हा वैष्णव भक्तोत्तम म्हणून गाजातो आहे.’ (पृ. १८४)

भक्त पुंडलिकाची कथा

उत्तम भक्तांच्या यादीत पुंडलिकाचं स्थान वरचं मानलं जातं. संत नामदेवाच्याही नंतर स्कंदपुराणांतर्गत मानले गेलेलं पांडुरंग महात्म्य रचलं गेलं. त्याचा रचनाकाल चौदावं ते पंधरावं शतक या दरम्यान असावा, असं डॉ. ढेरे म्हणतात. यामध्ये पुंडलिकाची कथा पहिल्यांदा आली आहे. त्यानंतर ‘पद्मपुराणांतर्गत पांडुरंगमहात्म्य’ हे पंढरपुरातील स्थानिक दैवताचं वैष्णवीकरण करणारं एक साधन आहे. दिंडीरवनात रुसून आलेल्या रुक्मिणीची कथा पहिल्यांदा या ग्रंथात आली असून त्याची रचना सोळाव्या शतकात झाली असावी, असा निष्कर्ष डॉ. ढेरे यांनी काढला आहे. यावरून पंधराव्या शतकात पुंडलिकाचा, तसंच सोळाव्या शतकात लखुबाईचा संबंध विठ्ठलाशी जोडून त्यांचं वैष्णवीकरण करण्यात आलं, हे स्पष्ट होतं. हा संबंध कसा आला ? हे भाविकांना पटावं म्हणून स्पष्टीकरणकथा रचण्यात आल्या व त्याच आज प्रचलित आहेत. त्यापैकी पुंडलिकाची कथा अशी–

पंढरपुरात आई-वडिलांची सेवा करणारा पुंडलिक नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची किर्ती ऐकून प्रत्यक्ष विष्णू त्याला भेटायला आला. तेव्हा आपल्या पडक्या घराची एक वीट त्याच्याकडे भिरकावून तीवर विष्णूला त्यानं उभं रहायला सांगितलं. मी लवकरच चंद्रभागेतून स्नान करून येतो, असं त्याने विष्णूला सांगितलं. चंद्रभागेत स्नान करीत असता आपल्या गावात आलेला देव पुंडलिकाची भेट झाली, तर निघून जाईल म्हणून चंद्रभागेने पुंडलिकाला पाण्याबाहेर निघू दिलं नाही. अर्थात, तो पाण्यात बुडून मरण पावला. तिकडे त्याची वाट पाहात विष्णू विटेवरच उभा राहिला. विटेवर उभा राहिला म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. चंद्रभागेत बुडाला म्हणून पुंडलिकाचं मंदिर भीमेच्या पात्रात चंद्रभागेच्या आहे, अशी वारकऱ्याची दृढ समजूत आहे. पुंडलिकाच्या भेटीसाठी विठोबा आला म्हणून पहिल्यांदा त्याचं दर्शन घेतात.

या कथेच्या मुळाशी पुराणांमधील पुंडलिकविषयक कथा आहेत. पद्मपुराणाच्या सहाव्या खंडात ऐंशीव्या अध्यायात तसंच नृसिंहपुराणात पुंडरिक या विष्णूभक्ताची कथा आहे. स्कंदपुराणात पुंडरिक व अम्बरीष या मित्राची कथा आहे. ते दोघेही दुष्कर्मी व वेश्यागामी आहेत. कान्होत्रिमलदासाच्या पुंडलिक चरित्रात पुंडलिकाच्या पित्याचं नाव कुंडलिक आहे. पद्मपुराणात सुकर्मा यांच्या कुंडल नावाच्या ब्राह्मणाच्या पुत्राची कथा आहे. या सर्व पुंडलिकाचा पंढरपुराशी काहीही संबंध नाही. पण त्यावरून प्रस्तुत पुंडलिक चरित्र तयार करण्यात मात्र कथाकारांना यश आलं आहे. या कथेचा प्रभाव वारकरी संप्रदायावर इतका आहे की, कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यांनी सिद्ध न होणारं पुंडलिकाचं अस्तित्व त्यांच्या भावविश्वात अविभाज्य अंग झालेलं आहे. त्याविषयी डॉ. ढेरे म्हणतात, ‘या कथेतील नितांतरम्य भावसत्याने विठ्ठलोपासनेची सर्व पुढची वैभवशाली पंरपरा परिपुष्ट केलेली आहे. भावसत्यं ही ऐतिहासिक सत्यांपेक्षा अधिक प्रभावी असतात. ती मानवी मनावर एवढा प्रभाव गाजवतात की, एखाद्या ऐतिहासिक युगपुरुषाच्या कार्याहूनही अधिक प्रभावी कार्य ती इतिहास घडवण्याच्या बाबतीत करू शकतात. भावसत्यं मानवी मनात रुजवणाऱ्या कथांचं हे सामर्थ्य ध्यानी न घेतल्यामुळे अनेक मान्यवर संशोधक–अभ्यासक पुंडलिकाचा–श्रीविठ्ठलाला पंढरपुरातील आणि भक्त–भाविकांच्या अंतरंगातील भक्तिभीमातीरावर समचरण कटिस्थितकर अवस्थेत उभा करणाऱ्या पुंडलिकाचा शोध इतिहासात घेत राहिले. इतिहासात तो न सापडल्यामुळेच त्याच्याविषयीच्या ऐतिहासिक कल्पना करीत राहिले आणि तरीही असा ऐतिहासिक दृष्टीने शोध घेताना तो न सापडल्यामुळेच खंतावत राहिले.‘ पुंडलिकाच्या कथेसारखीच लखुबाईची कथा सांगोवांगीने रूढ झाली आणि तिनेही एक इतिहास घडवला आहे.

लखुबाईची रखुमाई व तिचा रुसवा

उच्चारसाधर्म्यामुळे लखुबाईचा रखुमाई हा उच्चार सुलभतेने झाला. पंढरपुरातील विठोबाच्या मंदीरात विठोबा एकटाच आहे. त्याला विष्णूचा अवतार बनविल्यावर त्याच्या सोबतीला रुक्मिणीला आणण्याची गरज निर्माण झाली. कारण विठोबाच्या मूर्तीमध्ये गोपाळाचे गुणधर्म होते. मग त्याला कृष्ण मानलं गेलं. आधीच अस्तित्वात असलेल्या लखुबाईच्या नंतर विठोबा येथे आला. तो येथे येण्याचं कारण काय ? तर रुक्मिणीचा रुसवा अशी कल्पकता कुणीतरी लढवली. त्यातून कथानक तयार केलं गेलं. कृष्णाने द्वारकेत राधेला जवळ केलं, त्यामुळे रुक्मिणी त्यावर रुसून पंढरपुरातील दिंडीरवनात आली. तिची समजूत काढण्याकरिता कृष्ण पंढरपुरात आला व तो गोपाळपूर येथे राहिला. तेथून गोपवेषाने रुक्मिणीला भेटायला गेला. पंढरपुरातील गोपाळपूर हे गोपाळ या गुराढोरांच्या पालनातून उपजीविका करणाऱ्या जातीचं मूळ स्थान आहे, अशी त्यांची समजूत आहे. त्यांना गवळी असं म्हणतात. कृष्ण हाही गवळी होता. म्हणून तो आपल्या लोकांच्या वस्तीत पहिल्यांदा आला, अशी तार्किक संगती लागते. नंतर तो कोळ्यांची वस्ती असलेल्या दिंडीरवनात लखुबाईला म्हणजेच रुक्मिणीला भेटायला गेला. अशी कथा रचली गेली. कृष्णाला विठ्ठलरुपाने पंढरपुरात येण्याकरिता जी काही कारणं सांगितली जातात, त्यापैकी एक हे आहे.

पुंडलिकांच्या भेटीकरिता विष्णू विठ्ठलरुपाने आला, हेही एक कारण सांगितलं जातं. दिंडीरवनात माजलेल्या दिंडीरव राक्षसाला मारण्याकरिता विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचं रूप धारण केलं. आणि लोहदंडाने त्याचा वध केला. या कथेत पंढरपुरातील मल्लिकार्जुन् या दैवताला विष्णूरूप करून टाकलं. आणखी एक कारण सांगितलं जातं, ते पदूबाईचं, पदूबाई ही धनगरांची देवता आहे. तिच्याबद्दल कथा अशी आहे – पद्मा नावाची एक सुंदर युवती आपल्याला योग्य नवरा मिळावा म्हणून तपश्चर्या करते. तेव्हा तिच्याहूनही सुंदर रूप धारण करून देव तिच्यापुढे प्रकट होतो. देवाचं सुंदर रुप पाहून ती मोहित होते. त्यामुळे तिची वस्त्रे गळतात व केस मोकळे होतात. तिच्या या अवस्थेतून देवाच्या वरप्रदानामुळे मुक्तकेशी हे तीर्थ निर्माण झालं, अशी धारणा दृढ झाली.

भक्तांसाठी काही प्रश्न

या सर्व कथांमधून विठ्ठलाच्या पंढरपुरातील आगमनाची स्पष्टीकरणं देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सर्वच कथा भाविकांना भावतात व सर्वच देवतांपुढे तो भक्तिभावाने नतमस्तक होतो. पण त्याने आपली तर्कबुद्धी थोडी चाळवली, तर त्याच्या मनात काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यापैकी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे, राधेच्या प्रेमात डुंबलेल्या कृष्णावर रुसून रुक्मिणी जर पंढरपुरातील दिंडीरवनात आली असेल, तर तिथे रुक्मिणीचं मंदीर का नाही ? रुक्मिणीच्या रुसव्याचं कारण राधा असेल तर, तिच्या मंदिराशेजारी राहीच्या रुपात ती का आहे ? संपूर्ण महाराष्ट्रात जी विठ्ठल–रुक्मिणी मंदिरं आहेत, त्यात विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी असते. अगदी देवघरातील मूर्तीतही ती असते. मग विठ्ठलाचं मूळ ठिकाण असलेल्या पंढरपुरात विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी का नाही ? पुंडलिकाच्या भेटीसाठी जर विठ्ठल आलेला असेल, त्याच्या समाधीस्थळी विठ्ठलाच्या मूर्तीऐवजी शिवलिंग व मंदिराबाहेर नंदी का आहे ? विष्णूचा अवतार असलेला कृष्ण ज्या ज्या ठिकाणी मंदिरांमध्ये मूर्ती रुपात आहे, त्याच्या हाती बासरी, मुकुटावर मोरपीस व पायात आढी आहे, ती येथे का नाही ?

याशिवाय विष्णूचा तथाकथित अवतार मानलेला विठ्ठल विष्णूसहस्रनामात का नाही ? तसंच विष्णूच्या चोवीस अवतारांमध्ये त्याचा समावेश का नाही ? या प्रश्नांनीही वारकऱ्यांच्या डोक्यात झिणझिण्या येऊ शकतात. पण हे सारे प्रश्न त्यांना पडत नाहीत व पडू दिले जात नाहीत. एक तर वारकरी संतांनी त्याची स्पष्टीकरणं आपापल्या सोयीने दिली आहेत व बाकीची पंढरपुरातील बडवे-उत्पात मंडळी देत असतात.

विठोबा मूळचा पंढरपूरचा की माढ्याचा?

पंढरपुरातील विठ्ठलमूर्तीच्या लक्षणांविषयी वारकरी संतांनी आपल्या अभंगामधून जी माहिती दिली आहे, ती लक्षणे आज तिच्यात नाहीत. पण ती आहेत, असं ठसवण्याचा प्रयत्न बडवे करीत असतात. म्हणून एक महत्वाचा प्रश्न या बडव्यांसाठी आहे तो म्हणजे, विठ्ठल मंदिरातील सध्याची विठ्ठलमूर्ती संतांनी वर्णन केलेल्या लक्षणांनी युक्त नाही. याउलट सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातील माढा या गावात ती आहे…..मग खरा विठोबा पंढरपुरचा की माढ्याचा? तो जर मूळचा असेल, तर सध्याचा विठोबा केव्हा व कोठून आणला? खरं तर इतिहासकारांपुढेही हे एक प्रश्नचिन्ह आहे.

विठ्ठलमूर्तीच्या रूपलक्षणाविषयी वारकरी संतांनी आपल्या अभंगामधून जी माहिती दिली आहे. तशी ‘पांडुरंगमाहात्म्य’ या नावाच्या दोन संस्कृत ग्रंथांमधूनही ती आलेली आहे. स्कंदपुराणांतर्गत आलेले स्कांद व पद्मपुराणांतर्गत ते ‘पाद्म’ अशी ही दोन पांडुरंगमाहात्म्य आहेत. त्यापैकी पाद्मपांडुरंगामाहात्म्यामध्ये विठ्ठलाच्या छातीवर मुक्तामाळेप्रमाणे शोभणाऱ्या षडक्षरी मंत्रावळीचा उल्लेख आहे. (‘श्रीवस्त’ धारयन वक्षे मुक्तामालां षडक्षराम ! ३.४२) यात विठ्ठलाची प्रिया पद्मा हिला वैशंपायन ऋषी या मंत्राचं वर्णन करताना म्हणतात-

छंदोऽनुष्टुब् ऋषिर्व्यासो देवतास्य श्रिय: पति ।
वैष्णवोऽयं मनु: षडि्भर्वणैर्नादसिद्धीद: ॥ – २७.१०

ज्यांचा छंद अनुष्टुभ् आहे, ऋषी व्यास आहे, देवता विष्णू आहे, असा हा नारदाला सिद्धीप्रद ठरलेला षडक्षरी वैष्णव मंत्र वैशंपायनांनी पुढच्याच दोन श्लोकांत कूटतेने व्यकत केला आहे. स्कांद पांडुरंगमाहात्म्यसुद्धा श्रीविठ्ठल महामंत्रयुत (७.६२) असल्याचं सांगतं. हा मंत्र देवाच्या हृदयावर पाहायला मिळतो, (मंत्राक्षराणि देवर्षे हश्यन्ते तस्य वक्षसि), असं नारदाला वैशंपायनाने म्हटलं आहे. (११.६७) हा मंत्र कसा आहे ? तर –

स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं पृष्टषष्टं सदीर्घकम् ।
षणं षष्टानित्यंतं समारं तं विदुर्बुधा: ।। – स्कांद पां. मा. ११.७३

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी स्कांद पांडुरंगमहात्म्याचा शके १६८८ मध्ये म्हणजे इ. स. १७६६ मध्ये नकललेल्या प्रतीत हा पाठ असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे श्रीधरस्वामी नाझरेकर हे पंढरपूर परिसरातील होते व त्यांनी प्रत्यक्ष मूर्ती पाहून आपल्या दशाध्यायी पांडुरंगमाहात्म्यातही अनेक वेळा विठ्ठलाच्या हृदयावरील षडक्षरी मंत्राचा उल्लेख केला आहे. हा मंत्र पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या वक्षस्थळावर नाही, पण माढा येथील विठ्ठल मूर्तीच्या वक्षस्थळावर आहे व तो कूटभाषेत रचलेला आहे.

मंत्राच्या कूट भाषेचा उलगडा

माढा येथील विठोबाच्या मूर्तीवर कोरलेला कूटश्लोक असा आहे-
श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यंषणषटू सदीर्घकं ॥
षटषटू दिनंत्यंतं ससारं तं विदुर्बु धा: ॥ श्रीवत्स

माढा हे माहादजी निंबाळकरांचं जहागिरीचं गाव होतं. त्यांनी हे मंदिर बांधल्याचाही उल्लेख मंदिराच्या उंबरठ्यावर (पायरीवर) आहे. येथील कूटश्लोक स्कांद पांडुरंगमाहात्म्यातील श्लोकाशी जुळणारा आहे. त्याचा उलगडा प्राचार्य वि. प्र. लिमये यांनी डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या विनंतीवरून केला. त्यानुसार ‘ससारं तं विदुर्बुधा:’ या शेवटच्या चरणाचा अर्थ ‘तो मंत्र रहस्यासह ज्ञानी जन जाणतात,’ असा होतो. या मंत्राची पहिली ओळ श्री. मंगलार्थक एकाक्षरी शब्दाने सुरु होते. ‘स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं’ या नंतरच्या दोन शब्दांमधील स्पर्शाद्यं म्हणजे स्पर्श वर्णापैकी पहिला वर्ण (‘क’ पासून ‘म्’ पर्यंतचे वर्ण स्पर्शवर्ण) म्हणजे क् हा वर्ण होय. दुसऱ्या सत्यनामाद्यं या शब्दाचा अर्थ सत्याचं नाम असलेल्या ऋत या शब्दातील ऋ या पहिल्या वर्णाला मिळून कृ हा वर्ण तयार होतो. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या चरणात षण्, षट् असे शब्द आहेत व ते शब्द सदीर्घक म्हणजे दीर्घ होऊन झालेले ष्णा हे अक्षर जोडले (तर कृष्णा हा शब्द तयार होतो.) या शब्दाला नत्यंतं म्हणजे ज्या मंत्राच्या शेवटी नति आहे, तो, नति म्हणजे नमन व नमनाचा भाव असलेला नम: हा शब्द. अशा रीतीने विठ्ठलाच्या हृदयावर कोरलेल्या कूटश्लोकातून श्रीकृष्णाय नम: हा मंत्र व्यक्त होतो. विठ्ठलाचे वैष्णवीकरण झाल्यानंतर हा मंत्र त्याच्या वक्षस्थळावर कोरला गेला असवा. पण हा मंत्र पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्यामध्ये आढळत नाही. माढा येथील मूर्तीवर तो आढळतो. या मागील कारण काय ?

इतिहासाचार्य राजवाडे यांनी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती अफझलखानच्या स्वारीच्या वेळी शके १५८१ (इ. स. १६५९) माढे येथे हलवली होती, असं (ग्रंथमाला, १२.१, एप्रिल १९०५) म्हटलं होतं. माढयात विठोबाचं एक स्वतंत्र देऊळ तयार करून तेथे मूर्ती माढ्याला आणली होती, हे स्पष्ट होतं. नंतर संकट टळल्यावर ती येथून नेली असेल. पण ती काही काळ येथे होती, तिची आठवण म्हणून तशीच दुसरी मूर्ती घडवली असण्याची शक्यता आहे. सध्या माढ्याला जे विठ्ठल मंदीर आहे, त्यात विठ्ठलाच्या मूर्तीखाली मोठं शिवलिंग आहे. अर्थात, शिवलिंगावरच विठ्ठलमूर्ती (लिंगाऐवजी) बसवलेली आहे. विठ्ठलाला शिव मानूनच त्याची प्राणप्रतिष्ठा शाळुंकेवर (पिंडीवर) केलेली आहे. त्यामुळे हे शिवमंदीर आहे, असं काही अभ्यासकांचं मत आहे. या मंदिराची रचना एखाद्या मशिदीसारखी आहे. यावरून मोगली आक्रमणापासून बचाव करण्याकरिता तसं केलं असावं, हे स्पष्ट होतं. माढ्याच्या विठ्ठलमूर्तीच्या शिल्पशैलीवरून ते शिवकालीन शिल्प असावं, याचा अंदाज येतो. याच शैलीत पंढपुरातील रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी व राहीच्या मूर्ती घडवल्या आहेत. त्यांची उंची विठ्ठलमूर्तीपेक्षा कमी आहे. त्यावरून त्या उत्तरकालीन असाव्यात, हे दिसून येतं. पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती वालुकाश्माची (Sand Stone) तर रुक्मिणी व राही तसंच माढ्याची मूर्ती काळया पाषाणाची (Black Besolt) आहे. म्हणून त्या समकालीन असाव्यात, असा निष्कर्ष निघतो. माढा येथील प्राचीन मूर्तिशिल्पं व पुरातत्वीय अवशेष मी पाहिले आहेत. तिथे विठ्ठल मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका वळणावर उघडयावर गजलक्ष्मीची मूर्ती मला दिसली. तिच्याविषयी स्थानिक लोकांना विचारलं असता, ती सटबाईची मूर्ती आहे, असं लोकांनी सांगितलं. एखादी बाळंतीण अडली की, या मूर्तीला उपडी करतात. मग बाळंतिणीची सुटका होते. अशी समजूत येथील लोकांची आहे. माढ्याच्या मूर्तीतील लक्षणं पंढरपूरच्या मूर्तीत नाहीत, हे एक वास्तव आहे. म्हणून पुन्हा एक प्रश्न भेडसावत राहतो की,

मूळ मुर्ती कुठे आहे?

पंढरपुरापासून अवघ्या पस्तीस कि. मी. अंतरावर अरण-भेंड हे सावता माळी या यादवकालीन वारकरी संतांचं गाव आहे. त्यांनी एका अभंगात विठोबाचं वर्णन केलं आहे ते असं –

विठ्ठलाचे रुप अतर्क्य विशाळ । हृदयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवरी हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्द ब्रह्म साचे ॥ नाम विठ्ठलाचे कलियुगी ।

संत सावता महाराजांनी वर्णन केलेला विठोबा हा बाळरूप आहे. त्याच्या दिगंबर स्वरुपाचा वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात आणि मनगटात तोडे-वाळे आहेत. त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत. त्या हातामंध्ये पद्म व शंख ही वैष्णव लांछने आहेत. पद्म म्हणजे कमळ हे कळीच्या रुपात आहे. तिचा देठ त्याने उजव्या हाताचा अंगठा व तर्जनीत धरलेला आहे. त्याच्या हृदयरुपी कमळावर मंत्र असल्याचाही उल्लेख संत सावतामहाराजांनी केलेला आहे.

विठ्ठल मूर्तीच्या संतसाहित्यातील वर्णनानुसार माढा येथील मूर्ती दिगंबर रुपात आहे. तिच्या मस्तकावर गवळी टोपीसारखा कंगोरेदार मुकुट आहे. दोन्ही खांद्यावर टेकणारी शंखाकार कुंडलं आहेत. गळ्याशी व हृदयाशी लोंबणाऱ्या दोन माळा गळ्यात आहेत. दुसऱ्या माळेत कौस्तुभमणी आहे. दोन्ही माळांनी तयार झालेल्या त्रिकोणात वक्षस्थळावर गूढ नाममंत्र आहे. या मंत्रामध्ये शेवटी श्रीवत्स या शब्दांतून श्री वत्सलांछन हे विठोबाचं लक्षण सूचित केलेले आहे. डाव्या हातात शंख तर उजव्या हातात काठीवर तळवा टेकून बोटात कमळकळी घेतली आहे. दोन्ही हात कमरेवर ठेवलेले असून हातातील काठी स्पष्ट दिसते आहे. तिच्या मस्तकावर बांधलेल्या शिंक्याच्या दोऱ्या कपाळावरून मागे गेलेल्या आहेत. घोंगडे पांघरलेली ही मूर्ती गोपवेषधारी आहे. तिच्या कपाळावर आडवा तृतीयनेत्र आहे. ही सारी लक्षणं स्कांद पांडुरंग महात्म्यातील मूर्तीनुसार आहेत. मूळच्या पंढरपूरातील मूर्तीमध्ये ती होती हे यावरून स्पष्ट होतं, पण आजच्या मूर्तीत ती नाहीत. आज आपण माढा येथील मूर्तीला पाहून मूळ मूर्ती कशी असेल यांचा अंदाज व्यक्त करू शकतो.

पंढरपुरातील आजची मूर्ती सोळाव्या शतकापूर्वीची वाटत नाही, असं मत प्रख्यात इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी व्यक्त केलं होतं. पंढरपुरातील एक विद्वान, धर्मशास्त्राचे तज्ज्ञ बाबा पाध्ये यांनी तीन संस्कृत विठ्ठलस्तोत्रं लिहिली होती. त्यापैकी ‘विठ्ठलध्यानमानसपूजा’ या स्तोत्रात वर्णन केलेली पंढरपुरातील विठ्ठलमूर्ती माढ्यातील मूर्तीसारखी होती. विठ्ठल मूर्तीच्या नित्यसहवासातील व्यक्तीने लिहिलेलं हे स्तोत्र इ. स. १८०५ च्या दरम्यानचं असावं. याचा अर्थ तोपर्यंत तशा वर्णनाची मूर्ती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात होती. माढ्यावरून ती सुरक्षितपणे पंढरपुरात स्थापित केली होती. १८७३ मध्ये एका माथेफिरुने दगड हाणून विठ्ठलमूर्तीचा पाय तोडला होता. एकदा तर बडव्यानेच आपल्या आर्थिक स्वार्थापोटी विठ्ठलमूर्ती पळवून नेली होती. यावरून मूर्ती भंगल्यानंतर ती तेथून हलवली असावी व त्याठिकाणी दुसरी मूर्ती बसवली असावी. इतिहास संशोधक ग. ह. खरे म्हणतात त्यानुसार, सध्याची मूर्ती सोळाव्या शतकातील असावी. तरीही प्रश्न शिल्लक राहतो की, मूळ विठ्ठलमूर्ती आता कोठे आहे ? पंढरपुरातील बडवे–उत्पात मंडळी कितीही उरबडवेपणा करून हीच ती मूर्ती आहे, असं सांगत असतील, तरी त्यावर विश्वास कितपत ठेवावा ?

कानडा विठ्ठलु, कर्नाटकु!

विठोबाविषयी जे अनेक प्रश्न विद्वानांना पडले, त्यातील एक असाच महत्वाचा प्रश्न आहे व तो म्हणजे विठोबा महाराष्ट्राचा आहे की कर्नाटकाचा ? या प्रश्नाचं उत्तर खरं तर संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षापूर्वीच देऊन ठेवलं आहे ते असं –

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु । येणे मज लाविले वेधी ॥७॥
संत एकनाथांनीही विठ्ठल कानडी लोकांचं दैवत होतं, हे स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात–

नाठवेचि दुजे कानड्यावाचुनी । कानडा तो मनी ध्यानी वसे ॥(६३२)
तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरिये ।
विठ्ठल कानडे, भक्त हे कानडे । पुंडलिके उघडे उभे केले ॥(६३३)
एकनाथांनाही विठ्ठलासोबत पंढरपूर हे तीर्थक्षेत्रही कानडी तसंच भक्तही कानडे वाटतात. संत नामदेवांनीही त्यापूर्वी तसंच मत व्यक्त केलं होतं, ते असं –

कानडा विठ्ठल तो उभा भीवरेतीरी ।
भक्तांचे आर्त वो जीवा लागले भारी ।। (१०३१)
विठ्ठल कानडे बोलू जाणे ।
त्याची भाषा पुंडलिक नेणे ।। (१०८७)

नामदेवांनी तर विठ्ठलाची भाषाही कानडी असल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पण कानडा हा प्रादेशिक वा भाषिक उल्लेख नसून त्यातून न कळणारे म्हणजेच अनाकलनीय (वेदां मौन पडे । श्रुतीसी कानडे ॥ – संत नामदेव महाराज १०२७) असा अर्थ निघतो. त्याचप्रमाणे कर्नाटकु या शब्दाचा अर्थ देवाच्या लीला असा होतो, असा युक्तिवाद काही विद्वानांनी केला आहे. सोलापूर जिल्हयाचा कर्नाटकाला लागून असलेला भाग पहिला, तर आपण महाराष्ट्रात आहोत की कर्नाटकात हा प्रश्न पडतो. सोलापूर शहराचं स्वरूपही कानडीच आहे. पंढरपूर तर सीमेवरचंच गाव आहे. कर्नाटकातील लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचं प्रारंभीचं कार्य पंढरपुराजवळील मंगळवेढे येथूनच सुरू झालं. त्याचप्रमाणे पंढरपूरचं प्राचीन नाव पंडरगे हे तर स्पष्टपणे कर्नाटकी आहे. मग विठ्ठल कर्नाटकाचा आहे म्हटलं, तर बिघडलं कुठे ? विशेष म्हणजे, विठ्ठलाच्या प्राचीन मूर्ती सर्वाधिक कर्नाटकातच आहेत. ‌‌.
उत्तर कर्नाटकातील बदामीच्या द्वितीय पुलकेशीच्या धाकट्या भावाचं जन्मनाव बिट्ट किंवा बिट्टरस असं होतं. याच नावाचे राजे होयसळ वंशातही झाले आहेत. विठ्ठल नावाचेही राजे दक्षिणेत झाले आहेत. कानडी भाषेत विष्णू या शब्दाचं रूप विट्टी असं तयार होतं, हे डॉ. रा. गो. भांडारकर यांनी दाखवून दिलं आहे. बिट्टीवरूनच विठ्ठल हा शब्द बनला, असं ‘शब्दमणीदर्पणा’च्या अपभ्रंश प्रकरणातील ३२ व्या सुत्राचा आधार घेऊन राजपुरोहित यांनी दाखवलं आहे. तेव्हा विठ्ठल कानडी आहे, हे मान्य करायला हरकत नसावी.

विठोबा कुणाचा?

आतापर्यंत केलेल्या उहापोहातून विठ्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न कुणी व कसा केला, याचा अंदाज आपणास आला असेलच. तरीही एक प्रश्न शिल्लक राहतोच की, विठोबा मुळातील कुणाचा आहे ? शैव, वैष्णव, बौद्ध, जैन या पंथ-संप्रदायानी त्यांच्यावर आपला हक्क सांगितला होता. आता तर तो वैष्णव मानला जातो. पण वैदिकांनीही तो आपलाच आहे, असा हेका चालवला आहे. वारकरी संप्रदायातील एक विद्वान–सोनोपंत दांडेकर यांनी ‘हा पंथ पूर्ण वैदिक आहे, किंबहुना सनातन वैदिक धर्माची भक्तीस प्राधान्य देणारी ही एक शाखा आहे, असं म्हटलं तरी चालेल. या पंथास भागवत धर्म ही म्हणतात. कारण यांचं उपास्य दैवत हे श्रीकृष्णाचं बाळस्वरूप समजलं जातं’, असं म्हटलं आहे. दांडेकरांचं हे म्हणणं ऐतिहासिकदृष्टया खरं नाही. कारण विठोबाचा उल्लेख वैदिक साहित्यात कुठेही सापडत नाही. तसंच कृष्ण हा वैदिकांच्या विरोधात होता, हे स्पष्ट आहे…… महानुभाव संप्रदायाच्या लीळाचरित्रात ‘विठ्ठलवीरु कथन’ या लीळेत विठ्ठल हा मूळचा चोर होता व गोरक्षकांकडून मारला गेला. त्याच्या मुलांनी त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ भडखंबा म्हणजे स्मारकशिळा उभारली, अशी कथा आहे. गावातील गुराढोरांच्या रक्षकांच्या अशा स्मारकांना कर्नाटकात ‘वीरगळ’ असं म्हणतात. महानुभावांनी गोरक्षकाला चोर ठरवण्यामागे त्यांची द्वेषबुद्धी होती. होयसळ राजा विष्णूवर्धन विट्टीदेव किंवा बिट्टीदेव याने बाराव्या शतकात पंढरपूरचं देऊळ बांधलं असावं, असं ग. ह. खरे यांनी म्हटलं व विठ्ठल हे नाव त्याच्या नावावरून पडलं असावं, असंही ते म्हणतात.

विठ्ठल हा गवळी – धनगरांपैकी कुणीतरी गोरक्षणासाठी मृत्यू पावलेला वीर होता व त्याला पुढे विष्णूरुप प्राप्त् झालं, असं डॉ. जी. ए. दलरी, डॉ. ग्युंथर सोनथायमर, डॉ. शं. गो. तुळमुळे, डॉ. माणिकराव धनपलवार या विठ्ठलाभ्यासकांचं मत आहे.

डॉ. दुर्गा भागवत यांनी १९५६ मध्ये ‘लोकसाहित्याची रुपरेषा’ या ग्रंथात विठ्ठल गोपजनांचा म्हणजे गवळ्यांचा देव होय, हे मत पहिल्यांदा मांडलं. त्याच दिशेने दलरी, सोनथायमर तसंच डॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधन कार्य केलं. पण या मताला छेद देणारा निष्कर्ष नीरज साळुंखे यांनी काढला आहे. आपल्या ‘दैत्यबळी व कुंतलदेश महाराष्ट्र’ या शोधग्रंथात (पृ. १५७) ते म्हणतात ‘इ. १३११ च्या पंढरपूर शिलालेखात, श्री विठ्ठलदेव रवलदेवमूर्ती….. परिवंडे सेवकु विठ्ठल देवा क्षेत्रपति असा उल्लेख आहे’ यावरून क्षत्रिय हे त्यांचे सेवक होते, असं दिसतं. जातीधर्माच्या भिंती ओलांडून विठोबाने साऱ्यांना कवेत घेतलं आहे. असा हा देव साऱ्यांचाच आहे, असंच आता म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे शैव व वैष्णव हा सांप्रादायिक संघर्ष संपवल्याचं ते एक प्रतीक आहे. म्हणूनच त्याला एक महासमन्वय म्हणून समजायला हरकत नाही.

( ‘दैवतांची गोष्ट’ या आगामी पुस्तकामधून )

 पंढरीतील पांडुरंगाची मूर्ती किती वर्षांपूर्वीची आहे?

मुर्तीचे आयुष्य कार्बन डेटींग पध्दतीने ठरते. पण कोणीही असे करू देण्यास तयार होणार नाही. यावरून समाजात वाद होईल.

दुसरी पध्दती या विषयीच्या कथा जाणुन घ्याव्यात. तर्काने तो काल ठरवावा. पुंडलिकाने पांडुरंगाला विटेवर उभे केले आणि गेले २८ युगे पांडुरंग विटेवर उभा आहे. तर्काने पुंडलिकाचा काळ शोधात आला तर हे शक्य आहै.

जसे डाॕ. प.वि.वर्तक यांनी वाल्मिकी रामायणात दिलेल्या प्रभुरामचंद्रांच्या जन्मकुंडली मधील ग्रहांच्या स्थितीवरून हा काळ इसवी सन पुर्व ७०००+ वर्षे आहे.

तिसरा भाग

लाखो वारकरी आषाढीला तहान भुक विसरून कळसाच्या दर्शनासाठी का होईना पायी पंढरपूर ला जातात. ही अंधश्रध्दा नाही. ज्याला भक्तीयोग आणि भक्तीयोगातील पुजेचे महत्व व आनंद समजला तो प्रत्येक जण ज्या भावनेने वारी करतो तो भाव कृत्रिम रित्या निर्माण होत नाही.

विठ्ठलाची मंदीरे अनेक आहेत. पण पंढरपूर ला विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवा. ज्याचे पुर्वसुकृत आहे त्याला अष्टभाव दाटुन येतात. प्रेमाश्रू वाहतात.

इथे मुर्तीचे आयुष्य किती ? खरच पुंडलिकाने देवाला इथे उभे केले का ? एक युग म्हणजे किती वर्षे हे प्रश्न मनात येत नाहीत.

ज्या ज्या संतांना हे कळले त्यांनी आपल्या अभंगातुन हे वर्णन केले आहे.

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुकुटमणी देखा ।
पुंडलिक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा ह्मणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

– संत चोखामेळा

पांडुरंगाच्या मुर्ती विषयी ज्ञान हे पांडुरंगाविषयी प्रेम उपजत नसेल तर व्यर्थ आहे. यातुन फारतर पी एच डी मिळेल

 

विठ्ठल हे आराध्य दैवत असून कोट्यवधी हिंदू भाविकांचं श्रद्धास्थान आहे. तसेच विठ्ठल हे महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने आषाढी व कार्तिकी एकादशीला शासकीय पुजा होतात. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी असे ही म्हणतात. इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो. याबरोबरच देवळाचा बद्द्लचा उल्लेखही नंतरच्या काही शीलालेखांमध्ये पाहायला मिळतो. विशेषत: बाराव्या शतकात सापडलेल्या ' ८४ वा लेख ' हा शीलालेख सध्याच्या मंदिराबाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. आधीच्या देवळानंतर ८४ वर्षांनी या देवळाचा जीणोर्द्धार झाला आहे असे समजुन ८४ लक्ष योनीतून मुक्ती मिळण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगच देवळात प्रवेश करतात.

वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला (सहसा - दगडांचा अथवा लाकडाचा) स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात.

वीरगळ साधारणपणे अडीच किंवा तीन फूट दगडावर एकावर एक या पद्धतीने तीन किंवा चार चौकोन खोदून घेतले जातात. वीरगळाचे सामान्यपणे तीन किंवा पाच भाग असतात. सर्वांत खालच्या भागात वीर युद्धात लढत आहे, असे दाखवलेले असते. यातून लढाईचे कारण सुद्धा स्पष्ट होते.

स्रोत :-

विठ्ठल मंदिर, पंढरपूर - विकिपीडिया

वीरगळ - विकिपीडिया

 

उत्तर:

असं आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही पण पंढरपूरचा श्री विठ्ठल मुळात विरगळ आहे असा काही इतिहासकारांनी सिद्धांत मांडला आहे.


सर्वप्रथम वीरगळ म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या:

वीरगळ म्हणजे जी वीरांचे स्मारकशीळा असते त्यास वीरगळ म्हणतात.

हे वीर गावाचं, देशाचं, गाईगुरांचे, किल्ल्यांचे संरक्षण करताना मरण पावलेले असतात. त्या 'वीरा' च्या स्मरणार्थ असे जे स्तंभ उभारले जात असत त्या स्तंभावर त्या वीरांचे जीवन प्रसंग कोरले जात असत व त्यांची देव रुपात पूजाही केली जात असे.


पंढरपुरामध्ये जो वीरगळ सापडला आहे त्या वीरगळावर गाईचे रक्षण करताना वीरगती लाभलेल्या पुरुषाचे चित्र व लिंगपुजा करतानाचे चित्र आढळले.

यावरूनच विठ्ठल आणि वीरगळ यांच्या संबंधीची मांडणी प्रथम जी.ओ. दलरी यांनी केलेली दिसते. त्यानंतर जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठातील धर्मेतिहासज्ञ गुंथर डी. सोन्थायमर यांनी दलरींच्या मताचा स्वीकार केल्याचा आढळतो.

त्यांना पंढरपुरातील महाद्वारासमोरच्याच भागात एक वीरस्मारकाची शिळा म्हणजेच वीरगळ आढळल्यावर त्यांना महानुभावसंप्रदायातील 'लीळाचरित्रामधील' 'विठ्ठलवीरुकथन' ही लीळा आठवली.

लीळाचरित्रामधील श्री चक्रधर स्वामींचा विठ्ठलाच्या उगमाविषयीचा श्लोक

त्यांनी याकडे शं. गो. तुळपुळे यांचे लक्ष वेधले आणि शं. गो. तुळपुळे यांनी 'विठ्ठल मूळचा वीरगळच' हा लेख लिहिला.

यामधून त्यांनी दलरींचे मत आहे त्याच आधार देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

चोखोबाच्या समाधीजवळ असलेल्या वीरगळास विठ्ठलाचे मूळ स्वरुप मानले गेल्याचे दिसते. याचबरोबर लोकसाहित्य अभ्यासक विश्वनाथ शिंदे यांनीही 'श्रीविठ्ठलाची लोककथा' या लोककथेतील आशयावरून विठ्ठलाच्या वीरगळ स्वरूपाविषयी मत मांडलेल्या अभ्यासकांच्या मतास सहमती दर्शविल्याचे दिसते ते यावरून विठ्ठलाचे मूळ रुप म्हणजे भडखंबा म्हणजे वीरगळ आहे. विठ्ठलमंदिरात ही वीरगळ होती हे वरील गोष्टीवरून सांगता येईल.

विठ्ठल मूर्तीचे आजचे स्वरुप असे का? याचे उत्तर प्रा . धनपलवार यांनी वीरगळ हेच विठ्ठलाचे मूळ रुप आहे तेच बरोबर असावे वरील लोककथा त्या गोष्टीचा सबळ पुरावाच आहे. विवेचन पाहता मौखिक परंपरेतील लोककथेच्या आशयात आलेले विठ्ठलाचे रुप त्यांनी अभ्यासकांच्या मतांचा आधार घेऊन सांगितले असले तरी परंपरेने जोपासलेल्या रुपावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचा दिसतो.

विठ्ठलाच्या मूळ स्वरूपाविषयी विचार केला तर अभ्यासकांनी मांडलेल्या मतांवरून व वीरगळाच्यावर असलेल्या चित्रावरून विठ्ठल हे गोपजनीय दैवत ठरते.


शं. गो. तुळपुळे यांच्या इंग्रजीतील Research paper ची लिंक मी खाली दिली आहे, त्यांनी यात श्री विठ्ठल मूळचा वीरगळ आहे ही थिअरी सविस्तर स्पष्ट केली आहे.

धन्यवाद!

श्रीविट्ठलाची विशेष उपाधी आहे, पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे, असाच समज जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणून राजा होता. तो 'पौंड्रक वासुदेव' या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पधीर् असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला 'पौंड्रक' अशी उपाधी लावत होते, हे यावरून स्पष्ट होते. 'पौंड्रक' या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे 'पांडुरंग' होय. 'पौंड्रक' विट्ठलाचेच पुढे 'पांडुरंग विट्ठल' असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता. याचा साधा सरळ अर्थ असा की पौंड्र समाजातील जे पशुपालक, धनगर, कुरुब होते त्या समाजातील विट्ठलनामक आद्य वसाहतकार वा सम्राटाची पशुपालक वेशातील ही मूर्ती आहे.सातशे वर्षांहून अधिक काळ सामान्यजनांना वेड लावणाऱ्या आणि आपल्या भक्तीचे अजोड गारुड निर्माण करणाऱ्या

पांडुरंग विट्ठलाचे कूळ शोधण्याचा अनेक संशोधकांनी प्रयास केला, त्यातील हा नवा लक्षणीय शोध...

महाराष्ट्राचे आराध्य श्रीविट्ठल हे आजवर रहस्यच बनून गेले होते. विष्णुच्या २४ अवतारांत आणि विष्णु सहसनामांतही न सापडणारा हा एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठून आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेऊन संशोधकांनी श्रीविट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे, आणि कदाचित तो त्यामुळेच अयशस्वी ठरला आहे. खरेतर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या नामांतच श्रीविट्ठलाचे मूळ चरित्र दडलेले आहे, यावर कोणी विचार केला नव्हता. परंतु श्रीविट्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसून पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणून पुजतो आहोत. भजतो आहोत.

खरेतर संशोधकांनी पंढरपूरच्या पांडुरंग विट्ठलाचे मूळ शोधायचे असेल तर पांडुरंग, पंढरपुर, पौन्ड्रिक क्षेत्र आणि पुंडरिक या शब्दांवर, त्यांच्या व्युत्पत्तींवर सर्वप्रथम विचार करायला हवा होता. श्रीविट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निदेर्श होत असला तरी, विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. त्याला आता विष्णु वा कृष्णाचे रुप बहाल केले गेले असले तरी, ते त्याच्या मूळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे, असे मत डॉ. माणिकराव धनपलवार व डॉ. रा.चिं. ढेरे यांनी व्यक्त केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मिणीची समजूत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे, अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणून विट्ठलाचे आगमन झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणून जी समाधी आज आहे, ते प्रत्यक्षात शिवालय आहे, हेही डॉ. ढेरंेनी सिद्ध केले आहे. स्थलपुराणात पंढरपूरचा निदेर्श पौन्ड्रिक क्षेत्र म्हणून येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव 'पांडुरग माहात्म्य' असे आहे, 'विट्ठल माहात्म्य' नव्हे, हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

पौंड्रिक क्षेत्र म्हणून पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपूर हे स्थलनाम यावरून मी शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. 'पांडुरंग' ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपूर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून ती 'पौंड्रिक' या शब्दातच दडली आहे.

पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ 'पौंड्र' कोण होते, या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद समाजाचे मूळ सापडते ते इसवी सन पूर्व आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्माण व महाभारतात. विश्वामित्राच्या १०० मुलांपैकी पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब इ. मुलांनी दक्षिणेत येऊन राज्ये वसवली, असे ऐतरेय ब्राह्माणावरून दिसते. अन्य आख्यायिकेनुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडिसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे परंपरेने शुद मानले गेले असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनीही दक्षिण भारतात आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुयोर्धनाच्या बाजूने लढले होते.

थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानणे व विट्ठलाला विष्णु-कृष्णरूप मानणे हे अनैतिहासिक आहे, हे यावरून सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता, हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण-वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या, त्यामुळे मूळ सत्यावर जळमट पडले होते. पण आता तरी नव्या दृष्टिकानातून त्याकडे पाहावे.

 

महाराष्ट्रातील श्री कृष्ण जीला विठ्ठल जी म्हणून मानला जातो, तसेच त्यांना कुलदेवता म्हणून पूजले जाते. विठ्ठल जी हा श्री कृष्ण जी (विष्णु अवतार) आहे. पांडरपूरच्या विठ्ठल जीला कुणाचा कुंवारा नाही. राणी रुक्मणी श्री कृष्ण जीची पत्नी होती. महाराष्ट्रातील लोग विठ्ठल जी (श्री कृष्ण जी, श्री विष्णु जी)ची तोंड भरतात परंतु त्यांच्या लक्षात दुःखी असतात. हे त्याची कारणं आहे की त्यांनी केलेली भक्ती आपल्या ग्रंथांनुसार असलेली नाही. गीतेत स्पष्टपणे व्रत करणं मनाही आहे पण त्याप्रमाणे विठ्ठल जी उर्फ श्री कृष्ण जी (विष्णु अवतार) चे पूजन करणारे एकादशीचं व्रत करतात. आपल्या ग्रंथांनुसार भक्ती केल्यास जीवनात सर्व प्रकारचे लाभ मिळतात. गीता हिंदू समाजाचं सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे पूर्णपणे हिंदू समाज तर विश्वातील गीता जीचं अनुसरण करतं. पण तिचं गुह्यज्ञान तत्वदर्शी संतांचंच बाहेर आलेलं नाही. स्वतः गीता जी याचं सांगतं की तुम्हाला पूर्ण ज्ञान व आरोग्य मिळावं तर कोणत्याही तत्वदर्शी संतांचं शोध करून त्यांना ते सर्वज्ञान देणारं व मोक्षाचं मार्ग दाखवणारं असतं. आज या पृथ्वीवर तत्वदर्शी संत आलेलं आहे व लाखों लोगांना सुख देत आहे. अधिक माहितीसाठी आपण ज्ञानगंगा पुस्तक वाचू शकता. हे पुस्तक पूर्णपणे निशुल्क आहे व आपल्या घरी पोहोचविले जाते. या पुस्तकात गीता व इतर अनेक ग्रंथांबद्दल विस्तृतपणे सांगितलं आहे आणि ती पूर्णब्रह्म परमात्मा ची भक्ती कसं केली जातं, ह्याचं वर्णन केलं आहे ज्याचं गीता ज्ञानदाता स्वतः बोलत आहे. निशुल्क पुस्तक मिळवण्यासाठी दिलेल्या नंबरवर आपलं नाव व पत्ता व्हाट्सएप करा. आमचं नंबर - 6388277116. ही पुस्तक 25 ते 30 दिवसात आपल्या घरी पोहोचते.

महाराष्ट्रातील श्री कृष्ण जीला विठ्ठल जी म्हणून मानला जातो, तसेच त्यांना कुलदेवता म्हणून पूजले जाते. विठ्ठल जी हा श्री कृष्ण जी (विष्णु अवतार) आहे. पांडरपूरच्या विठ्ठल जीला कुणाचा कुंवारा नाही. राणी रुक्मणी श्री कृष्ण जीची पत्नी होती. महाराष्ट्रातील लोग विठ्ठल जी (श्री कृष्ण जी, श्री विष्णु जी)ची तोंड भरतात परंतु त्यांच्या लक्षात दुःखी असतात. हे त्याची कारणं आहे की त्यांनी केलेली भक्ती आपल्या ग्रंथांनुसार असलेली नाही. गीतेत स्पष्टपणे व्रत करणं मनाही आहे पण त्याप्रमाणे विठ्ठल जी उर्फ श्री कृष्ण जी (विष्णु अवतार) चे पूजन करणारे एकादशीचं व्रत करतात. आपल्या ग्रंथांनुसार भक्ती केल्यास जीवनात सर्व प्रकारचे लाभ मिळतात. गीता हिंदू समाजाचं सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणजे पूर्णपणे हिंदू समाज तर विश्वातील गीता जीचं अनुसरण करतं. पण तिचं गुह्यज्ञान तत्वदर्शी संतांचंच बाहेर आलेलं नाही. स्वतः गीता जी याचं सांगतं की तुम्हाला पूर्ण ज्ञान व आरोग्य मिळावं तर कोणत्याही तत्वदर्शी संतांचं शोध करून त्यांना ते सर्वज्ञान देणारं व मोक्षाचं मार्ग दाखवणारं असतं. आज या पृथ्वीवर तत्वदर्शी संत आलेलं आहे व लाखों लोगांना सुख देत आहे. अधिक माहितीसाठी आपण ज्ञानगंगा पुस्तक वाचू शकता. हे पुस्तक पूर्णपणे निशुल्क आहे व आपल्या घरी पोहोचविले जाते. या पुस्तकात गीता व इतर अनेक ग्रंथांबद्दल विस्तृतपणे सांगितलं आहे आणि ती पूर्णब्रह्म परमात्मा ची भक्ती कसं केली जातं, ह्याचं वर्णन केलं आहे ज्याचं गीता ज्ञानदाता स्वतः बोलत आहे. निशुल्क पुस्तक मिळवण्यासाठी दिलेल्या नंबरवर आपलं नाव व पत्ता व्हाट्सएप करा. आमचं नंबर - 9643254949. ही पुस्तक 25 ते 30 दिवसात आपल्या घरी पोहोचते.

 

खरा इतिहास )

दक्षिण भारतात *इस्लामी* सत्तेचा उदय म्हणजे *बहामनी राज्य* होय. दिल्लीचा बादशहा मंहमद तुघलक याचा अस्पृश्य समाजातून मुसलमान झालेला दौलताबादचा एक सुभेदार *झाफरखान* याने आपल्या धन्याविरुद्ध बंड पुकारून एक स्वतंत्र राज्याची स्थापना इ. स.1347 मध्ये केली आणी तो *दुसरा महमदशहा* हा दक्षिणेतील दौलताबाद येथे राज्य करीत असतांना इ. स.1475 साली भयंकर *दुष्काळ* पडला. त्यावेळी त्याच्या राज्यातील *मंगलवेढे* गावाचा एक मालगुजाऱ *दामाजी पंत कुलकर्णी* नावाचा सात्विक ब्राह्मण गृहस्थ होता.

मंगलवेढे गावातील दुष्काळात चाऱ्याच्या अभावी जनावरे आणी उपासमारीमुळे माणसे पटापट मरू लागली होती. गावातील कोठारात सरकारी धान्य भरून होते. लोकांचे दुष्काळामुळे होत असलेले हाल *दामाजी पंताला* पाहावले गेले नाही. म्हणून त्याने सुलतानाच्या लष्करातील कोठारात भरून ठेवलेले धान्य लोकांना वाटून दिले. काही दिवसानंतर ही बातमी दौलताबाद येथे सुल्तानापर्यंत जाऊन पोहचली. ह्याचा त्याला भयंकर राग आला. सुल्तानाने आपल्या सैन्य अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाठविले, त्यांनी चौकशी केली व दामाजी पंत कुलकर्णी यास दोषी ठरवून त्याला अटक केली आणी त्याच्या मुसक्या बांधून त्याला सुल्तानाच्या दरबारात घेऊन गेले.

विठू नावाचा *महार* हा मंगलवेढे गावात राहत होता. या भानगडीच्या वेळी तो सरकारी कामानिमित्त राजधानी दौलताबाद येथे गेला होता. तो आपले सरकारी कोतवालीचे काम आटोपून घरी परत आल्यावर, गावात पसरलेली शांतता व गावातील लोकांचे उतरलेले निराश चेहेरे पाहून त्याने आपली बायको *रुखमा* हिला याबद्दल विचारले. तेंव्हा त्याला समजले की, आपल्या गावचा मालगुजाऱ ' दामाजी पंत ब्राह्मण ' याला सुल्तानाच्या शिपायाने मुसक्या बांधून पकडून नेले. ही गोष्ट *विठू महाराला* न आवडल्याने रात्री, त्याने आपले स्वतःचे जमिनीत पुरून ठेवलेले कलदार सोन्याचे रुपये खोदून बाहेर काढले आणी ते सर्व पोत्यात भरून, ते पोते पाठीवर घेऊन पायी चालत जाऊन सरळ राजधानीत हजर झाला. दामाजी पंताने मंगलवेढे गावातील लोकांना वाटलेल्या धान्याच्या किंमती इतक्या कलदार सोन्याच्या मोहरा सरकारी अधिकाऱ्याला मोजून देऊन पैसे मिळाल्याची सरकारी पावती *विठू महाराने* प्राप्त केली.

त्यावेळी *विठू महाराचे* रूप असे होते. त्याचे वर्णन कवीने अशा प्रकारे केले आहे.

*फाटक्या चिंध्या रुक्मिणी कांत*!

*मस्तकी बांधोनी मुंडासे त्वरित*!

*कंठी घालून काळे सुताचा दोरा*!

*कानात घातल्या त्याने पगरा*!!

*कांसेसी बांधोनी लंगोटी*!

*हाती सत्वर घेतली काठी*!!

दामाजी पंताच्या काळातील महारांचा वेश म्हणजे डोकीस फाटके मुंडासे, गळ्यात काळा दोरा, कानात पितळेच्या बाऱ्या, कमरेला लंगोटी, पायात फाटका जोडा व हातात काठी असा त्याचा वेष होता. असे वर्णन ब्राह्मण कवीने आपल्या काव्यात केले आहे.

*विठू महार* ती सरकारी पोच पावती घेऊन सरळ राजधानी दौलताबाद येथील सुल्तान दुसरा महमदशहा याच्या दरबारात हजर झाला. सरकारी पोच पावती पाहून सुल्तानाचे समाधान झाले. त्याने दामाजी पंत कुलकर्णी या मालगुजाराला मुक्त करण्याचे आदेश आपल्या अधिकाऱ्याला दिले. मालगुजाऱ दामाजी पंत मोकळा झाला व तो सर्व गावभर विठू महाराची स्तुती करू लागला. विठू महाराची कर्तबगारी पाहून संपूर्ण मंगलवेढे गावातील लोक आश्चर्यचकीत झाले आणी संपूर्ण बहामणी राज्यातील सर्व गावात याची चर्चा जिकडे - तिकडे होऊ लागली. आपल्याला विठू महाराने सुल्ताना च्या कैदेतुन मुक्त केल्याबद्दल दामाजी पंत ब्राह्मणाने, बहामणी राज्याच्या सुल्तानाच्या आदेशाने बावन हक्काची *सनद* स्वतः लिहून व सुल्ताना कडून शिक्कामोर्तब करून मंगलवेढे गावातील सर्व लोकांसमक्ष *विठू महाराला* बहाल केली. तत्कालीन महाराष्ट्रातील सर्व अठरा लाख सोमवंशीय *महार लोकांस* 52 हक्काची *सनद* प्राप्त झाली आहे हे कळावे म्हणून याच सनदेची उजळणी *मुंगी पैठण* येथील एकनाथ स्वामींचे देवळात हिजरी सन 1051 श्रावण शुद्ध शके 1563 म्हणजे दिनांक 13 रविवार 1475 रोजी करण्यात आली. विठू महाराचे नाव त्याच्या कर्तबगारीमुळे महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात जिकडे - तिकडे सर्वदूर पसरले. त्याचे कौतुक व वाहवाही सर्वत्र होऊ लागली. अशा प्रकारची एका *महाराची* झालेली प्रसिद्धी काही दृष्ट ब्राह्मणास आवडली नाही. काही दिवसांनी तो काळा दिसणारा उदार अंत:करणाचा कर्तबगार विठू महार मरण पावला. महारांची कीर्ती अधिक वाढू नये म्हणून ब्राह्मणांनी एका दगड फोडीचे काम करणाऱ्या वढार जातीच्या गृहस्था कडून काळ्या दगडाची मूर्ती तयार करून घेतली व तिला विटेवर उभी करून विठू महाराच्या नावाचा विठ्ठल! विठ्ठल! विठ्ठल असा गजर सुरु केला व त्याच्या नावाची कवने रचून विठू महाराला *विठ्ठल* या देवाचा अवतार करून टाकला. काही दिवसांनी कुणबी, मराठा व इतर बहुजन समाज शेतकरी वर्गाकडून ब्राह्मणांनी वर्गणी गोळा करून चंद्रभागा नदीचे काठी *पंढरंपुरात* एक देऊळ तयार केले आणी त्या देवळात ती काळ्या दगडाची काळी मूर्ती, विठू महारांची बसविण्यात आली. त्या देवळात पूजापाठ सुरु करून पुजारीपण ब्राह्मणांनी आपल्याकडे घेतले. ही मूर्ती आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवू मोठया आश्चर्यचकीत मुद्रेने आपल्या भक्ताकडे पाहत असते. नवीन अख्यायिका पसरविण्यात आल्यामुळे ब्राह्मण वर्गाकडून अशिक्षित, अडाणी आणी भाविक अशा सर्व हिंदू जातीच्या लोकांची पूजेकरिता गर्दी त्या ठिकाणी होऊ लागली. कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट न करता आयता मलिंदा ब्राह्मण पुजारी विठोबाच्या नावाने खाऊ लागले. म्हणून म्हटले गेले आहे की, *काय सांगू देवाची या मात! झाला महार पंढरीनाथ*!!

दौलताबादच्या बहामणी सुल्तानाच्या दरबारात स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या सोन्याच्या कलदार मोहरा मोजून देऊन *दामाजी पंत* या ब्राह्मणांची तुरुंगातुन सुटका करणारा *विठू महार* नाहीसा झाला. आणी विटेवर उभा असलेला काळाकुट्ट *विठ्ठल* नावाचा देव पुढे आला.*विठू महार* बहुजन समाजाचा देव झाला परंतु त्याच्याच अस्पृश्य समाजाला त्याच्या देवळात जाऊन दर्शन घेण्याची मनाई करण्यात येते. केवढा हा दैवदुर्विलास! कशी ही विडंबना! दरवर्षी हजारो भाविक विठ्ठल, विठ्ठल करीत दर्शनाला जातात. मोठया मेहनतीने वर्षभर कामावलेला जवळचा पैसा अडका पंढरपूरातील ब्राह्मण पंडीत पुरोहिताना दान - दक्षिणा देऊन कंगाल होऊन परत येतात. परंतु *विठू महाराने* केलेल्या कर्तबगारीला सर्व लोक विसरून गेले आहेत, असेच म्हणावे लागेल.

( सदर लेख हा *भारतीय अस्पृश्याची शौर्यगाथा* या पुस्तकातून असून पृष्ठ.क्रं.92,93 व 94 चा उतारा आहे.)

 

मध्यप्रदेश मधील विदिशा मधील उदयगिरी मधील गुहा मध्ये 3 ऱ्या शतकात काढलेल्या मूर्तीचा आणि पंढरपूर विठोबा मूर्तीत प्रचंड साम्य आहे. इतिहासकार अजुन संशोधन करत आहे.

वारकरी संप्रदायाहा संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला, हे सांगता येत नाही.

सोलापूर गॅझेट मध्ये जी माहिती पंढरपूर व वारकरी यासंबंधानें प्रसिध्द केली आहे तींत या पंथास तेराव्या शतकाच्या शेवटीं होऊन गेलेले संत ज्ञानेश्वर यानीं आरंभ केला असें जें लिहाले आहे, तें चुकीचें आहे. पण तरीसुद्धा वारिविषयीक ही पहिली सूचक लिखाण आहे.

संत बहिणाबाईनी (१६२८-१७००) 'संतकृपा जाली । इमारत फळा आली' ह्या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटले आहे,. कदाचित् हें विधान बहिणाबाईचा म्हणून एक अभंग प्रसिध्द आहे त्यावरुन केलेलें असेल-

* संत कृपा झाली । इमारत फळा आली ॥१॥
ज्ञानदेवें रचिला पाया । रचियेलें देवालया ॥२॥
नामा तयाचा किंकर । तेणें केला हा विस्तार ॥३॥
जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ॥४॥
भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥५॥

या अभंगांत बहिणाबाईंनें वारकरी मंदिराच्या वाढीचा इतिहास फारच सुंदर रीतीनें वर्णन केला आहे. परंतु त्यांतील 'रचिला पाया' याचा अर्थ त्यांनींच सुरुवात केला असा नव्हे. श्रीतुकाराममहाराज यांनीं श्रीज्ञानदेव यांची योग्यता व कार्य हीं ज्या अभंगांत वर्णिलेली आहेत, त्यांत ते म्हणतात:-
'जयानें घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥ (श्रीतुकाराम ३८४१ स.सं.था)

आणि हेंच वस्तुस्थितीस धरुन आहे. श्रीज्ञानदेव यांच्या कालाच्याहि पूर्वी वारकरी भक्त होते.पंढरपूरची वारी ही संत ज्ञानेश्वर यांची आधीही चालू होती, असे दिसते. ज्ञानेश्वरांचे वडील बरीच वर्षे पंढरीची वारी करीत असत, असे म्हटले जाते. पंढरपूर येथे विठ्ठलाचे देवस्थान केव्हापासून अस्तित्वात आले ह्याचा निश्चित कोणालाच माहिती नाही , तर ती बाब वारकरी सप्रंदायाच्या आरंभाचा काल निश्चित करण्यास साहाय्यभूत होऊ शकेल.

त्यामुळे वारीची सुरुवात आणि पंढरपूर ची प्रसिद्ध अशी मूर्ती यांची सांगड घातली पाहिजे.

1) पांडुरंगाची कथा ही पद्मपुराणांत आहे. परंतु तेथें तिथे आपण नक्की वर्ष सांगू शकत नाही. शिवाय हे कधी लिहले आणि त्यामध्ये नवीन addition वेळेनुसार शतकी नी शतके चालू राहिल.पांडुरंग शटक स्त्रोत्र याची शंकराचार्य यांनी याची निर्मिती केली ती आठव्या शतकात. संत नामदेव नुसार संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत वारी करायचे दाखले आहेत.

2)युगे अठ्ठावीस उभा अशी जी संतांनी शिकवण दिली आहे त्रम्यात सुद्धा 28 युगे quantify करणे विज्ञाननिष्ठ लोकांना चालणार नाही.

3)मंदिरात असलेल्या तीन शिलालेख शके ११३१, शके११५९आणि शके ११९५ च उल्लेख आहे.

४)चौथा पुरावा अजुन इतिहासकार मान्य करत नाही . मालूतारण' नामक ग्रंथाचा पुरावा. याची ग्वाही झाल्यास श्रीपांडुरंग मूर्तीचा शालीवाहन शके ४१५ पासून इतिहास सांपडतो, असें सिद्ध होईल. नरहरी धुंडिराज मालू यांनी लिहिले आहे की शालिवाहन राजाने जंगल कापून पंढरपूर ची स्थापना केली आणि मूर्ती बसवली. त्यावेळीीरामचंद्र सोनार या कडे शहराचा आधीकर होता. हा पुरावा मनाला तर याची उत्पती पहिल्या शतकात झाली अस म्हणून शकतो. पण याला इतिहासाचा आधार नाही कोणताही पुरावा नाही. अनेक इतिहासकार नी हला मान्यता दिली नाही.

दोन महिण्यापूर्वी वर्तमानपत्रात या विहीरी बद्दल एक बातमी झळकली होती.

"पंढरपूर पालखी मार्गावरील वाखरी येथील प्राचीन बाजीराव विहीर जतन करण्यास यश ! विहीर न बुजवण्याविषयी पुरातत्व विभागाचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र प्रशासनाने घेतला सकारात्मक निर्णय".

या विहीरी बद्दलची माहिती अशी की, पंढरपूर-पुणे पालखी महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग करण्याचे काम चालू आहे. हे काम करतांना वाखरी-भंडीशेगाव दरम्यान असलेल्या बाजीराव विहिरीचा अडथळा येत असल्याने ती बुजवण्याचे काम चालू होते. ही विहीर ऐतिहासिक असल्याने ती बुजवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. याविषयी इतिहास संशोधक आणि मोडी लिपी तज्ञ राज मोमणे यांना माहिती मिळताच त्यांनी पुणे येथील पुरातत्व विभागाशी संपर्क साधून पुरावे दिले. त्यामुळे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक वि.पुं. वाहणे यांनी विहीर न बुजवण्याविषयी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र पाठवले आहे. बाजीराव विहीरीच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी सव्हिर्र्स रोड कमी करणे आणि सव्हिर्र्स रोड वळवणे, असे दोन प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवले आहेत. त्यामुळे बाजीराव विहीर नामषेश होणार नसल्याचे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पालखी मार्गावरून येतात. या पालखी सोहळ्यातील सहस्रो भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी अनुमाने २०० वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी विहीर बांधली. या विहीरीजवळ श्री विठ्ठलास तुळस प्रिय असल्याने तुळस आणि फुलांची झाडे लावण्यात आली होती.

सध्या या विहीरीजवळ आषाढी यात्रेसाठी पालखी सोहळे पंढरपूरकडे येतांना गोल आणि उभे रिंगण करतात, तसेच काही वेळ विश्रांतीही घेतात.

चित्रस्रोत : e-lokmat.com

स्थानिकांनी केलेल्या संघटित विरोधामुळे प्राचीन विहीरीला जीवदान मिळाले आहे.

बाजीराव विहीरीच्या पायऱ्या विहीरीतल उत्तम बांधकामाचा नमुना आहे. विहीर जवळपास २०० वर्ष असल्याने ती नियमानुसार प्राचीन स्मारकाच्या व्याख्येत मोडते. ही विहीर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदिकरणाच्या कामात नष्ट करण्यात येऊ नये.

याबाबत संबंधितास उचित आदेश करुन प्राचीन वारसा जपण्यास सहकार्य करावे असे पत्र सोलापूर जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकृत अधिकारी यांना पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वि. पुं. वाहणे यांनी दिले आहे.

अशी एकंदरीत अद्यावत माहिती आहे.

स्रोत :

 

विठ्ठल मंदिर पंढरपूर हे होयसाला साम्राज्याचा राजाने म्हणजे विष्णुवर्धन ने भक्त पुंडलिक जो की एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे त्याच्या विनंतीवरून बांधले असे मानतात.

सध्याच्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या एका शिलालेखावर एक जुना १२३७ चा एक लेख आढळला आहे. त्यावर असे लिहिले आहे की होयासाला राजा सोमेश्वर हे एक गाव दान म्हणून दिले.

परंतु बर्‍याच इतिहासकारांचे मत असे आहे की विठ्ठल मंदिर हे तेराव्या शतकाच्या अगोदरच बांधली गेले आहे.पांडुरंग हे नाव सहाव्या शतकातील राष्ट्रकुट साम्राज्याच्या तांब्याच्या एका पत्र्यावर आढळले आहे. त्यामुळे कदाचित हे मंदिर सहाव्या शतकात बांधले गेले असावे असे वाटते.

14 व्या शतकामध्ये ज्यावेळेस बहामनी साम्राज्याच्या मलिक कफूर याने होयसला व यादव साम्राज्याचा नाश केला,त्यावेळेस पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही विजयनगर साम्राज्य हलवण्यात आली .तेच आज हंपी येथे विजय विठ्ठल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तलिकोटा च्या लढाईनंतर हंपी साम्राज्य ढासळले ,तरीसुद्धा आज शिल्पकलेचा एक उत्तम नमुना म्हणून हंपी प्रसिद्ध आहे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट आहे.

ज्या वेळेस विजयनगर साम्राज्याची राजे कृष्णदेवराय यांना वाटले कि पंढरपूर आता सुरक्षित आहे, त्यावेळेस त्यांनी ती विठ्ठलाची मूर्ती संत भानुदास यांच्याकडे सोपवली व अशाप्रकारे ती मूर्ती परत पंढरपुरास आणली गेली. अशाप्रकारे विठ्ठलाचे वारकरी आणि हरिदास असे दोन सांप्रदायिक असणारे भक्त तयार झाले. वारकरी म्हणजे महाराष्ट्रातील आणि हरिदास हे कर्नाटकातील भक्त होय.

अजून तरी विठ्ठलाची मूर्ती किती जुनी आहे हे कोणालाच माहीत नाही.

 

 ·
फॉलो करा

पंढरपूरच्या मंदिरातील बौध्द शिल्पाकृतीचा संदर्भ किंवा फोटो उपलब्ध आहेत का? आपण ते द्याल का?

व्हाट्सअप्प विद्यापीठातुन अनेक निनावी शोध निबंध फिरत असतात. त्यात काही बौद्धजिवी (बुद्धिजीवी नाही) मंदिरांच्या आणि बुद्धांच्या संबंधांतील अकलेचे तारे तोडत तर्क लावतात. त्यातीलच वाचून उद्भवलेला हा प्रश्न.

यामागील तथ्य शोध :

  1. पंढरपूराच्या विठ्ठल मंदिरात बौद्ध शिल्प सापडले जरी, तरी ते बुद्धांची वास्तू म्हणता येणार नाही. कारण स्वाभाविक आहे, की तत्कालीन काळात कोणत्याही वास्तू निर्मितीसाठी कोणतीही जात धर्म ओळख न ठेवता फक्त कलाकार व मूर्तिकार म्हणून मंदिर निर्माण सोपवले जायचे. मग मूर्तीकार ज्या कला शैलीत (school of art) कुशल व कौशल्यवान असेल तो त्याच शैलीत मूर्ती वा मंदिर निर्माण करायचा. भारतातील मंदिर अनेक स्थापत्य शैली आहेत. त्यापैकी पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे नगर व द्रविडी मंदिर रचना शैलीत बनले असून विमान प्रकारात मोडते. अद्याप भारतात काय जगात कोणतेही बुद्ध स्तूप हे विमान स्थापत्य प्रकारात आढळलेले नाही.
  2. ताजमहाल जरी शहाजहान ने इस्लामिक आर्ट स्कुल मध्ये बनविण्याचा प्रयत्न केला असला तरी ते निर्माणासाठी मजूर हे राजस्थानी व येथील स्थानिकच होते त्यामुळे ताजमहाल च्या अनेक शिल्पात राजपुत शैलीतील अनेक शिल्प ताजमहालावर आढळतात मग यामुळे ते राजपूत महाल म्हटले जात नाही, त्याचप्रकारे सदरील विठठल मंदिर निर्माणवेळी बौद्ध शिल्प आढळले तरी म्हणजे एखादा शिल्पकाराचा हात बुद्ध शिल्पात कुसर आहे म्हणूंन त्याच्या पद्धतीप्रमाणे विठ्ठल मंदिरात बुद्ध शिल्प आढळलेले होऊ शकते.
  3. या मंदिराच्या शिखर घुमटावर अनेक देवी देवतांसहित दशावताराच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. त्यात नववा अवतार बुद्ध म्हणूंन येतो व याचमुळे घुमटावर दशावतारातील बुद्ध मूर्ती आहे. आता शेकडो मूर्त्यांत एक बुद्ध मूर्ती मिळाली म्हणजे मंदिराचा सरळ संबंध बुद्धांच्या वास्तुशी लावणे हा मूर्खपणा आहे.
  4. पुरातत्वशास्त्रज्ञ असे म्हणतात की “विठ्ठल मंदिर हे बाराव्या ते चौदाव्या शतकातील आहे”. सदरील कालखंडाचा भौगोलिक इतिहास पाहता या काळात महाराष्ट्रात नामदेवांचा भागवत धर्म व वैष्णव परंपरा चालत होती. शिवाय या काळात सोलापूर जवळ अथवा महाराष्ट्रात बौद्धांच्या कोणत्या वास्तू निर्माणाचे उल्लेख सापडत नाही ( लेणी, विहार-स्तूप वैगरे) त्यामुळे विठ्ठल मंदिर निर्माण हे बुद्ध वास्तू म्हणून झाले असावे.
  5. भारतात शिल्परचनेत गांधार शैली, मथुरा शैली, अमरावती शैली, राजपूत वास्तू शैली, मौर्यकालीन शैली, हडप्पाकालीन शैली व द्राविडी-संगम शैली इ. प्रकार आढळतात. बुद्धांच्या अधिकतः मुर्त्या ह्या गांधार व मथुरा शैलीत आढळतात. किंचित अमरावती शैलीत देखील आढळतात. त्यापैकी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील मुख्य विठ्ठलाची मूर्तीशिल्प शैली ही मथुरा व गांधार शैलीतील नसून द्रविडी शैलीत येते. आता गांधार - मथुरा व द्राविडी शैलीत फरक काय…. बघा खाली
    1. द्रविड मूर्ती शैलीत मूर्तीचे नाक हे जाड बुंध्याचे व गोलाकार असते तर मथुरा- गांधार शैलीतील मूर्त्यांचे नाक हे टोकदार, लांब,किंचित बारीक, आकारबंध असतात.
    2. द्रविड मूर्ती शैलीत मूर्तीचे केस हे लांब अथवा सरळ असतात तर मथुरा गांधार शैलीतील मूर्त्यांचे केस हे घुंगरु व कुरळे असतात.
    3. द्रविडी मूर्ती शैलीत देवाचे पाय हे जाड गोलाकार आकारबंध व नखे गोलाकार वळलेली असतात तर गांधार व मथुरा शैलीत मूर्त्यांचे पाय हे लांब, साधे, व नखे त्वचेला घट्ट चिकटलेली, किंचित गोल वळलेली असतात ( दोघी उभ्या मूर्ती चे निरीक्षण केल्यास)
    4. द्रविडी मूर्ती शैलीत मूर्तीच्या अंगावर उपवर्ण किंवा कोणतेही कापड सापडत नाही फक्त कंबरेखालील सोवळे अथवा गुंडाळलेले वस्त्र परिधान असतात तर गांधार किंवा मथुरा शिल्प शैलीत मूर्त्यांचे अंगावर पांघरलेले वस्त्र अधिकतः आढळतात. (कारण तुम्ही दाक्षिणात्य द्रविडी लोकं बघाल तर तिकडे लोकं देखील तसेच लुंगी लावून वरती उघडे असतात)
    5. द्रविडी मूर्त्यांचे डोळे पूर्ण झाकलेले किंवा पूर्ण उघडे असतात व त्यांचा आकार सामान्य माणसाप्रमाणे साधे असतात (जुन्या मुर्त्या पाहता) तर मथुरा- गांधार शैलीतील मूर्त्यांची डोळे हे अधिकतः अर्धे उघडे किंवा पूर्ण झाकलेले, मोराप्रमाणे नक्षीदार असतात.
  1. असे वरील मुद्दे पाहता तुम्हास हे लक्षात येईल की पंढरपूरचे विठ्ठल बुवांचे मंदिर व मुर्त्या ह्या नगर - द्रविडी शैलीत येते. वरील ताजमहालाच्या उदाहरणाप्रमाणे एखादे शिल्प असू शकते. परंतु दशवतारात बुद्ध आहे म्हणजे ते बुद्ध शिल्प आहे हे चुकीचे आहे.
  2. शिवाय विठ्ठल-बुद्ध प्रकरण स्पष्ट करण्यासाठी संतांच्या अभंगातील बुद्धबद्दल उल्लेख दाखवू नका कारण भक्तीमार्गी संत हे नरात नारायण, जीवात परमेश्वर असे ही सांगतात म्हणजे ते सामान्य माणसात नारायण पाहू शकतात तर विठ्ठलात बुद्ध पहिला तर त्यात काय हे स्पष्ट होत नाही की विठ्ठल म्हणजे बुद्ध. धरिला पंढरीचा चोर देखील संत जनाबाई म्हणतात म्हणजे आमचा विठ्ठल चोर देखील आहे.
  3. बुद्धांच्या मुर्त्या व वास्तू गांधार, मथुरा व अमरावती शैलीत कोरल्यागेल्या म्हणजे त्या शैलीवर बुद्धांचाच copyright आहे असे नाहीच. ती कला आहे तिला स्वातंत्र्य आहे, म्हणूंन गांधार शैलीतील विष्णूच्या मुर्त्या जरी असल्या तरी त्या बुद्ध म्हणवता येणार नाही.
  4. प्रारंभिक मध्य काळात अनेक बुध्द विहरांचे मंदिरात रूपांतरण केले गेले हे मान्य आहे म्हणजे मग सर्वच मंदिरे हे आधीचे बुद्ध वास्तू होत्या असा तर्क लावणे देखील चुकीचे ठरेल.
  5. मुळात विठ्ठल हा कानडी ( कर्नाटकातील) देव आहे. दक्षिण भारतात बुद्धांचा प्रभाव अत्यंत नगण्य असल्यामुळे बुद्ध मुर्त्या आढळणे अपवादच. अन त्यात सुद्धा नाविन्यपूर्ण कृती बुद्ध मूर्ती असणे अशक्यच. जगात अनेक बुद्ध मुर्त्या आहेत मात्र एक शुद्ध बुद्ध मूर्ती ही कमरे वर हात ठेवून नसलेली आहे. त्यामुळे मु. पो. पंढरपूरचा मूळ कानडी विठ्ठल बुद्ध होऊच शकत नाही.
  6. पंढरपुरातील विठ्ठल बुद्ध जरी असला तरी काय फरक पडणार आहे ? बुद्ध सर्वांचेच आहेत, ज्याला पटेल त्याने तसे पूजन करावे की काय बुद्धांवर देखील आधीच्या धर्मांध ब्राह्मणांप्रमाणे copyright आहे. नाही ना ? याचमुळे जेष्ठ संशोधक डॉ. ढेरे, राजवाडे यांनी फक्त संभावना व्यक्त केल्या की विठ्ठलच बुद्ध आहे, परंतु त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की आता याने काही फरक पडत नाही. कारण हा बुद्ध दशवतारांचा ९ वा अवतार अन आपण जो बुद्ध शोधताय तो बुद्ध मूर्तिपूजा, देव, आत्मा न मानणारा

त्यामुळे आपल्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे की पंढरपुरातील विठ्ठल मंदिरावर बौद्ध शिल्पाकृती आहे पण ती दशवतारांतील आहे.

चैतन्य आर्य. पुणे


....तळटीपा….

https://www.drishtiias.com/hindi/to-the-points/paper1/indian-sculpture-part-1

Sculpture in the Indian subcontinent - Wikipedia

विठोबा

मंदिर वास्तुकला - Drishti IAS

रावणानुग्रह


लेख - १४

आपल्या देशात पुराणकथा या खूप समृद्ध आणि मुळापर्यंत रुजलेल्या आहेत. याच कथा मंदिरांमध्ये कोरलेल्या बघायला मिळतात. आज आपण ज्या बोधकथा वाचतो तसच काहीसं काम या शिल्पांमध्ये कोरलेल्या कथा मंदिरांना भेट देणाऱ्या भक्तांसाठी करत असतात. अशीच एक सुप्रसिद्ध कथा म्हणजे रावणानुग्रह. महाराष्ट्रात तर ही कथा दिसतेच पण ओडिसा, कर्नाटक, इत्यादी राज्यात देखील ही कथा खूप लोकप्रिय आहे.

रावण हा अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी असा असुर गणांचा राजा, लंका हे त्याचे राज्य. कुबेराला युद्धामध्ये हरवून परत येताना त्याला कैलास पर्वत वाटेल लागला. शंकराचा भक्त असलेल्या रावणाने त्याला भेटायला जायचे ठरवले पण द्वारपाल त्याला वर जाऊ देईनात. हा अपमान झाल्यावर तो अहंकारी रावण चिडला आणि जिथे मला जाता येत नाही तीच जागा घेऊन लंकेत जातो म्हणून त्याने कैलास पर्वत उचलण्याचा निर्णय घेतला. ही कथा थोड्याफार फरकाने रामायण, ब्रह्म पुराण, इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये वाचायला मिळते.

शिल्पाचे निरीक्षण करत या कथेचा उत्तरार्ध पण बघुयात. सर्वात खाली आपल्या विस हातांनी तो पर्वत उचलून धरायचा प्रयत्न करणारा रावण कोरलेला आहे. त्याच्या बाजूला द्वारपाल बसलेले आहेत. ते बसलेले आहेत कारण शिव हे कैलास पर्वताच्या वरच्या भागात आहे आणि द्वारपाल खाली. शिल्पामध्ये पर्वताची भव्यता दाखवण्यासाठी ही रचना केलेली आहे. रावणाने पर्वत हलवल्यावर जो हादरा बसला त्याने पार्वती शंकराच्या अंगावर कलंडली, तीची दासी मागे पळून जाताना दिसते आहे. या सर्व कोलाहलात शंकर मात्र शांत आहेत. रावणाच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या बोटाने तो पर्वत खाली दाबला, ही ताकद एवढी प्रचंड होती की पर्वताचे सगळे वजन रावणाच्या अंगावर आहे. शिल्पात बघितले तर दिसेल की त्याचा एक एक हात गळून पडतो आहे. वजनाने त्याचा चेहरा रडवेला झाला आहे. आपली झालेली चूक लक्षात येताच त्याने शंकराची स्तुती करणारे - शिवतांडव स्तोत्र म्हणायला सुरुवात केली आणि शंकराने प्रसन्न होऊन रावणाला अभय दिले. रावणाला या प्रसंगात शंकराने तलवार किंवा वीणा भेट दिली असे उल्लेख देखील अनेक ठिकाणी बघायला मिळतात.

एखाद्या अफाट शक्तिशाली माणसाचा अहंकार मोडण्यासाठी परमेश्वराच्या पायाचे फक्त एक बोट पुरेसे ठरते. माणसाने आलेल्या संकटांमध्ये असेच शंकरासारखे शांत आणि स्थिर राहून त्याचा सामना करावा हाच विचार या शिल्पामधून व्यक्त करायचा असेल.

शिल्पं - रावणानुग्रह
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे
आठवे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

 

अभिषेक लक्ष्मी

लेख - १३

अनेक संकल्पना मागच्या काही हजार वर्षांपासून आपल्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत आणि यातल्या बहुतांशी संकल्पना निसर्गाच्या विविध घटकांपासून बनलेल्या आहेत. जीवनदायी नद्या या देवी झाल्या, त्यांना मंदिरांमध्ये मूर्ती रुपात स्थान मिळाले, आपल्याकडे डोंगर पुजले जातात, समुद्राची पूजा होते, सूर्य तर प्रमुख देवतांपैकी एक आहे, निसर्गचक्र जसे घडते त्यावर आपले सण, समारंभ, उत्सव साजरे होतात. अशीच एक सुंदर संकल्पना आज आपण इथे बघणार आहोत. 

अगदी सुरवातीच्या काळात "श्री" म्हणून ओळखली जाणारी ही देवता पुढे गजलक्ष्मी म्हणून ओळखली जाऊ लागली. वैभव, ऐश्वर्य आणि समृद्धीची देवी म्हणून आपण हीचे पूजन करतो. तिच्या अशा सर्वव्यापी स्वरूपामुळे सगळ्याच धर्मात हिचे पूजन केले जाऊ लागले. रामायणात आलेल्या एका कथे प्रमाणे रावणाने आपल्या पुष्पक विमानाच्या दारांवर गजलक्ष्मी काढलेली होती. 

आपण जे शिल्पं बघणार आहोत ते संभाजीनगर जवळ वेरूळ लेण्यांमध्ये असलेल्या १६ नंबरच्या कैलास लेण्यातील आहे. मुख्य द्वारातून आत गेल्यावर समोरच हे प्रचंड शिल्पं दिसते. जीवनाचे एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे पाणी आणि समृद्धीची लक्षण म्हणजे कमळ. या तलावात उमललेल्या कमळावर लक्ष्मी बसलेली आहे. कमळाच्या शेजारी दोन हत्ती कुंभामध्ये पाणी भरत आहेत. पाणी भरण्यासाठी गुडघ्याने लावलेला जोर देखील इथे कलाकाराने कोरला आहे. वरचे दोन हत्ती त्या पाण्याने लक्ष्मीला अभिषेक करत आहेत. वरच्या बाजूला वेगवेगळे गंधर्व आणि इतर आकृती कोरल्या आहेत. 
इथे हत्ती म्हणजे ढग अशी कल्पना करून, अभिषेकाला  पावसाची उपमा दिली आहे. आणि यामुळे बहरून येणारी सृष्टी म्हणजेच लक्ष्मी अशी संकल्पना या शिल्पात बघायला मिळते. 

निसर्गाची अत्यंत सुंदर मांडणी कलाकाराने पूर्ण जीव ओतून या शिल्पामध्ये केली आहे. सतत सुरू असणारे चक्र आणि त्यातून बहरणारी सृष्टी यांची सांगड अत्यंत अचूकपणे मांडलेली संकल्पना म्हणजेच - अभिषेक लक्ष्मी. 

शिल्पं - अभिषेक लक्ष्मी,
वेरूळ - १६ नंबर कैलास लेणे,
संभाजीनगर
८ वे शतक. 

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

 

चामुंडा

लेख - १२

मानवी जीवनात स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगामध्ये अत्यंत प्राचीन अशा उपासनेत शक्ती उपासना येते. या उपासनेचे पुरावे भारताबरोबरच इराण, मेसोपोटेमिया, सीरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त, इत्यादी प्राचीन संस्कृतींमध्ये देखील सापडतात. स्त्री ही मातेच्या रूपामध्ये उत्पत्तीचे प्रमुख लक्षण म्हणून येते. नंतरच्या काळात अनेक संदर्भाने शक्तीचे पूजन होऊ लागले पण उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीच्या अवस्थांमध्ये असलेले तिचे महत्व अजून तसूभरही कमी झालेले नाही.

प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक कथा येतात, त्याप्रमाणे कौशिकी देवीच्या भृकुटीपासून संहार करण्यासाठी जी देवी तयार झाली ती म्हणजे चामुंडा. अग्निपुराणात चामुंडेचे विस्तृत वर्णन आले आहे. जसे शिवाचे उग्र रूप म्हणजे भैरव तसेच देवीचे उग्र रूप म्हणजे चामुंडा. आपल्याकडे पुजली जाणारी महाकाली, काली, भद्रकाली ही सगळी पार्वतीचीच उग्र रूपे आहेत.

आता हे शिल्प समजून घेऊयात. बघितल्यावर अंगावर काटा आणणारे हे शिल्पं आहे. संहार आणि मृत्यू यांची देवता म्हणजे काय याचे प्रत्यक्ष दर्शन या शिल्पातून होते. प्रथमदर्शनी दिसते ती प्रेतावर बसलेली भयंकर अशी चामुंडा. अंगावर कतड्याच्या खाली फक्त सापळा, त्यावर दिसणाऱ्या अंगातल्या रक्तवाहिन्या आणि धमण्या, आत गेलेलं पोट आणि भीषण असे खोल गेलेले डोळे.
चार हतांपैकी दोन हात तुटलेले, छातीजवळ असलेल्या हातात कपाल नावाचे भांडे पकडले आहे. छातीवरच्या बरगड्या आणि गळ्यातल्या पेशी खूप बारकाईने कोरलेल्या आहेत. डोक्यावर चक्क अग्निज्वाळांचा मुकुट आहे. गळ्यात नरमुंडमाळा कोरलेली आहे. मांडिजवल हातात एका माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. सर्वात खाली घोरपडी सारखा दिसणारा प्राणी चामुंडा बसलेल्या प्रेताचा लचका तोडायचा प्रयत्न करतो आहे तर कुत्र्यासारखा प्राणी खाली तुटून पडलेला माणसाचा हात खात आहे.
बीभत्स आणि भयंकर संकल्पना या शिल्पामध्ये चिन्हांकित केल्या आहेत.

कलाकाराने घडवलेले शिल्पं, त्यामध्ये कोरलेल्या भावना व्यक्त करत असेल तर ते त्या कलाकाराचे खरे कसब. आपल्याकडचे सगळेच कलाकार हे एकापेक्षा एक सरस कामगिरी करून दाखवणारे. थेट काळजाला भिडणाऱ्या संकल्पना, नाट्य शास्त्रात आलेले रस हे सर्व त्या कलाकारांनी आपल्या कलेत ओतले. हे शिल्पं बघितल्यावर समोर उभी राहते ती मूर्तिमंत भिती. या शिल्पात कोरलेली भिती आपल्याला भावते म्हणून हे शिल्पं सुंदर ठरते आणि तो कलाकार महान!

शिल्पं - चामुंडा
८-९ वे शतक
भुबनेश्वर स्टेट म्युझियम, ओडिशा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
9960936474

 

नटराज

लेख - ११

या सृष्टीची चक्र ही एका लयीवर चालत असतात. सूर्य - चंद्र, इतर ग्रह - तारे यांच्या हालचाली त्या त्या प्रमाणबद्ध टप्प्याने होत असतात. कुठलीही कला सादर करत असताना हीच लय सर्वात महत्त्वाची असते. ती जर सांभाळता नाही आली तर स्टेजवर काय किंवा विश्र्वामध्ये काय - जो होतो तो प्रलय!
हीच वैश्विक लय सांभाळण्याचे काम शंकर आपल्या नृत्यातून करत असतो. तंडू ऋषींनी जे नृत्य शंकराला शिकवले तेच म्हणजे तांडव! या तांडवाचे १०८ प्रकार चिदंबरम इथे असलेल्या मंदिरावर कोरलेले आहेत.

आपण जे शिल्पं बघणार आहोत ते वेरूळ येथील २१ नंबरच्या रामेश्वर नावाच्या लेणी मधले आहे. याच लेणी मध्ये कार्तिकेय, मातृका, दुर्गा अशी इतर सुंदर शिल्पं देखील कोरलेली आहेत.
या शिल्पमध्ये सर्वात खाली डावीकडे कोरलेले आहेत वादक, यांच्यापैकी एकाच्या हातात बासरी दिसते आहे तर दुसरा समोर तबल्यासारखे वाद्य घेऊन बसलेला आहे. सतराव्या शतकात अमीर खुसरो याने हे वाद्य आपल्याला दिले या चुकीच्या समजुतीचा पुरावा भारतीय शिल्पांमध्ये दिसतो. वर गणपती आहे. सगळ्यात वर डाव्या कोपऱ्यात तीन मुखांचे ब्रह्मदेव आहेत पण तिथला बाकीचा भाग हा खराब झाला आहे. विष्णू, इंद्र आदी देवता उजव्या वरच्या कोपऱ्यात कोरलेल्या आहेत. सर्वात खाली शंकराच्या नृत्याकडे मग्न होऊन बघणारी पार्वती आणि तिच्या मागे मांडीवर कार्तिकेयाला घेऊन उभी असलेली दासी. शिवाचे शिल्पं खालून बघताना दिसतो तो त्याच्या पायांमध्ये लुडबुड करणारा त्याचा अत्यंत जवळचा भक्त - भृंगी. शिवाचा एका पाय दबलेला तर एक थोडा वर उचललेला - जे जे चांगले आहे ते टिकून राहावे आणि जे जे वाईट आहे ते नष्ट व्हावे अशी या मागे असलेली प्रेरणा आहे. कमरेवर शंकराने वाघाचे कातडे नसलेले आहे. डावीकडच्या वरच्या हातात शिवाचे अत्यंत प्रिय वाद्य आणि नृत्याची लय सांभाळणारे डमरू, पण दुर्दैवाने इतर हात तुटलेले आहेत. चेहऱ्यावर असलेली अत्यंत शांत मुद्रा, अर्धे मिटलेले डोळे आणि कपाळावर कोरलेले तिसरे नेत्र. डोक्यावर असलेल्या जटा या नृत्याच्या प्रचंड वेगाने मोकळ्या झाल्या आणि त्या शंकराच्या खांद्यावर पसरल्या आहेत. स्थिर शिल्पांमध्ये वेग कोरायचे कलाकाराचे कौशल्य हे आपल्याला समजण्याच्या पलीकडचे आहे.

आजचा दिवस आपण शंकर आणि पार्वतीच्या लग्नाचा दिवस म्हणजेच पुरुष आणि प्रकृती यांचा दिवस, समुद्र मंथनातून बाहेर आलेले हलाहल आजच शंकराने प्राशन केले, अशा अनेक कारणांसाठी महाशिवरात्र आपण साजरी करतो. आपल्या अस्तित्वासाठी कारणीभूत असणाऱ्या या शक्तीला मनापासून वंदन!

शिल्पं - नटराज
रामेश्वर लेणे, वेरूळ
७-८ वे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

भैरव

लेख - १०

शंकराच्या अनेक रौद्र रुपांपैकी एक म्हणजेच भैरव, याचा अर्थच भरण करणारा असा होतो. आपल्याकडे गावागावांमध्ये दिसणारा भैरोबा, काळभैरव, भैरव, क्षेत्रपाल ही सगळी त्याचीच नावं आहेत. आपल्याला असलेले दुःख कमी व्हावे, गावांच्या वेशी सुरक्षित राहाव्यात, इत्यादी कारणांसाठी भक्त याच्याकडे धाव घेतात. वराह पुराण यासंबंधी कथा आपल्याला वाचायला मिळते. भैरव या देवतेला काशीचा रक्षक सुद्धा म्हणतात. अगदी दोन हतांपासून ते अठरा हातांपर्यंत या भैरवाच्या मूर्ती आपल्याला दिसतात. रानी की वाव - पाटण, दिल्ली नॅशनल म्युझियम, कोल्हापूर कोपेश्वर मंदिर, इत्यादी ठिकाणी खूप सुंदर भैरव शिल्पं कोरलेली आहेत.

आज आपण जे शिल्पं बघणार आहोत ते भुबनेश्वर येथील संग्रहालयात असलेला भैरव आहे. डावीकडून शिल्पाचे निरीक्षण करूयात.

भैरव हा बहुतांशी वेळेला नग्न दाखवला जातो. पायाशी त्याचे गण किंवा सेवक कोरलेले आहेत. खडावा (हाय हिल्स) घालून तो उभा आहे. चतुरहस्त - चार हातांचे शिल्पं आणि हातामध्ये खड्ग - तलवार, त्रिशूळ, डमरू आणि माणसाचे तुटलेले मुंडके पकडले आहे. त्या मुंडक्यातून येणारे रक्त आणि मांस खाण्यासाठी खाली असलेला कुत्रा वर बघतो आहे (इथे कुत्र्याचे तोंड तुटले आहे). वरून पायाकडे जाताना मुकुटमध्ये मध्य भागी कोरलेला नागाचा फणा आणि खाली नरमुंड, कपाळाच्या मधोमध तिसरा डोळा, भुवया वर खचलेल्या, डोळे वटारलेले, ओठांमधून बाहेर आलेले सुळे, या उग्र रुपात कोरलेले सुंदर दागिने, कमरेचा बाक अत्यंत सुंदर कोरला आहे, संपूर्ण नग्न शिल्पं, कमरेपासून खाली नरमुंड माळा आणि गुडघ्यांवर वेटोळा मारून बसलेला नाग. उग्र रूप म्हणजे नक्की काय हे या शिल्पावरून आपल्याला कळतं. अनेक रसांपैकी एक बीभत्स रस तो या शिल्पात आपल्याला दिसतो.

ब्रह्महत्यचे पाप मिटवण्यासाठी शिवाने १२ वर्ष कापालिक व्रत केले आणि हीच या भैरवाची उत्पत्ती.
भैरवाची संकल्पना महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पसरलेली आपल्याला दिसते.

शिल्प - भुबनेश्वर स्टेट म्युझियम,
ओडिशा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

नरसिंह

लेख - ९

विष्णू या देवतेची अनेक वेगवेगळी रूपं आहेत. हतांमधल्या आयुधांचा जो क्रम आहे त्यावरून तयार होणाऱ्या चोवीस वेगवेगळ्या मूर्ती, विष्णूचे अवतार, संयुक्त आणि संकीर्ण मूर्ती असे अनेक प्रकार आहेत. यापैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असणाऱ्या म्हणजे विष्णूच्या अवतार मूर्ती. पुराणांमधून या संदर्भातल्या अनेक कथा आपल्याला वाचायला मिळतात. आज आपण विष्णूच्या नरसिंह या अवताराची माहिती घेणार आहोत. योग, शांत, उग्र, लक्ष्मी सह अशा अनेक प्रकारांमध्ये नरसिंहअवतार शिल्पं बघायला मिळतात. 

हिरण्यकश्यपू नावाच्या असुर राजाला वरदान मिळाले की त्याला घराच्या आत किंवा बाहेर मृत्यू येणार नाही, देव मारू शकत नाही किंवा दानव, हत्यार, मनुष्य, जनावर या कशानेही मृत्यू येणार नाही, तो सकाळी मारणार नाही किंवा रात्री. एवढे ताकदवान वरदान मिळाल्यावर त्याने तीनही लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरवत आपला दरारा वाढवला. देवांनी विष्णूकडे याचना केली की यातून आम्हाला वाचव. इथे गीतेमध्ये सांगितलेला श्लोक आपल्याला आठवतो - जेंव्हा जेंव्हा या सृष्टीमध्ये अन्याय होईल, त्या त्या वेळेला धर्मसंस्था परत मार्गावर आणण्यासाठी मी येईन. 

परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्|
धर्मसंस्था परार्थाय सम्भवामि युगे युगे||

यानंतर विष्णूने नरसिंह म्हणजेच ना देव ना दानव, ना मनुष्य ना प्राणी असे रूप घेऊन, घराच्या उबऱ्यावर संध्याकाळी हिरण्यकश्यपू असुराचा वध केला. त्याला मांडीवर घेऊन पोट फाडणारा नरसिंह तुम्ही सर्वांनी बघितला असेल, पण हे युद्ध एवढं सोप्पं होतं का? 
नाही! 

दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले, त्यात शेवटी जेंव्हा नरसिंहाने त्याला पकडले आणि आता तो त्याला मांडिरवर घेणार बरोबर हाच क्षण कलाकाराने या शिल्पामध्ये पकडला आहे. 

कर्नाटकात पटदक्कल नावाच्या प्राचीन वारसा स्थळामध्ये असलेल्या मंदिरावर हे शिल्पं आहे. डावीकडून हे शिल्प बघायला सुरू करूयात. हिरण्यकश्पूच्या हातामध्ये पकडलेली तलवार, त्यामधून नरसिंहाने हात मध्ये घालून त्याला पकडले आहे, मागच्या भिंतीवर जुना रंग कसा असावा याच्या छटा दिसतात, नरसिंहाची आयाळ, मुकुट, मोठे डोळे आणि उघडलेला जबडा यातून दिसते ती जरब आणि राग, हिरण्यकश्यपूचे दोन्ही खांदे नरसिंहाने पकडले आहेत, त्याच्या बोटांची नखे देखील कलाकाराने कोरलेली आहेत. आणि या शिल्पामध्ये बघायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरण्यकश्यूच्या चेहऱ्यावर कलाकाराने कोरलेली मूर्तिमंत भिती! 

आपल्याकडे मंदिरांवर असलेला दगड देखील भावनेने ओतप्रोत भरलेला आहे. तो लाजतो, हसतो, चिडतो, रागावतो फक्त आपल्याला बघता आलं पाहिजे! 

शिल्प - नरसिंह
 पटदक्कल (जागतिक वारसा स्थळ - World Heritage site)
विरूपाक्ष मंदिर - आठवे शतक

इंद्रनील सदानंद बंकापुरे 
9960936474

 

सप्तमातृका

लेख - ८

चराचर सृष्टीच्या तीन अवस्था आहेत. उत्पत्ती, स्थिती आणि लय. या तीनही अवस्थांसाठी अनुक्रमे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव हे कारणीभूत ठरतात. यामध्ये उत्पत्ती आणि लय यांच्या मध्ये असणारी स्थिती म्हणजेच या सृष्टीचा विकास. या विकासासाठी कारणीभूत ठरणाऱ्या काही गोष्टी आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे सप्तमातृका. वामन पुराणामध्ये जी कथा येते त्यामध्ये या सप्तमातृकांची उत्पत्ती ही देवीने केलेल्या सिंहनादातून झाली. याच बरोबर मत्स्य पुराण, अग्नी पुराण, देवी भागवत, इत्यादी ग्रंथांमध्ये आपल्याला या कथा वाचायला मिळतात. या मातृकांची संख्या अगदी ६४ पर्यंत गेलेली बघायला मिळते. सप्तमातृका ही संकल्पना बदलत्या काळात एवढी समृद्ध झाली की प्राचीन भारतात असलेल्या अनेक राजांची अधिष्ठात्री देवता म्हणून यांचे पूजन होऊ लागले. सात प्रमुख देवतांच्या शक्ती स्त्री रूपामध्ये संकल्पित केल्या गेल्या त्याच या सप्तमातृका.

आता या शिल्पाच्या माध्यमातून हा शिल्पपट समजून घेऊयात. इथे आधी मातृका आणि प्रमुख देव अशा क्रमाने हा शिल्पपट बघुया.
सर्वात आधी डावीकडे आपल्याला दिसतो तो विणाधर शिव, शेजारी तीन मुख असलेली ब्रह्माणी (ब्रह्मदेव), पायाशी नंदी आणि हातात त्रिशूळ घेतलेली माहेश्वरी (शिव),  हातात भाला आणि पायाशी मोर असलेली कौमारी (कार्तिकेय), हातात शंख आणि पायाशी मनुष्य रुपातला गरुड असलेली वैष्णवी (विष्णू), वराह रूप शक्ती वाराही, हातात वज्र आणि पायात ऐरावत असणारी एंद्री किंवा इंद्राणी (इंद्र) आणि सर्वात शेवटी अंगाचा सापळा असलेली चामुंडा. या चामुंडेच्या पुढे नंतरच्या काळात गणपती देखील आपल्याला दिसतो.

महाराष्ट्रात वेरूळ, कोपेश्वर - कोल्हापूर, इत्यादी ठिकाणी खूप सुंदर सप्तमातृका पट आपल्याला बघायला मिळतात. मध्यप्रदेश मध्ये पठारी नावाच्या गावाजवळ असलेल्या टेकडीवर पाचव्या शतकातला सप्तमातृका पट आहे. यावर राजा जयत्सेन याने त्याच्या लेखात या देवींचा उल्लेख - "भगवते मातरः" असा केला आहे.

अगदी ऋग्वेदाच्या आधीपासून सुरू असलेली ही मातृका पूजन परंपरा आहे. यावरून देवीची पूजा आणि अनुषंगाने स्त्री या संकल्पनेशी जोडले गेलेले दैवत्व भारतात किती प्राचीन आहे याची कल्पना इथे येते.
शेवटी काय, ती आहे म्हणून आपण आहोत. ती नाही, तर काहीच नाही!

शिल्प - सप्तमातृका पट,
६-७ वें शतक
दिल्ली नॅशनल म्युझियम

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

हरिहर

लेख - ७

भारतामध्ये प्रमुख पाच पंथ प्राचीन काळापासून आहेत. शैव - शंकर उपासक, वैष्णव - विष्णू उपासक, शाक्त - शक्ती उपासक, गाणपत्य - गणपती उपासक आणि सौर्य - सूर्य उपासक. यांची यांची अत्यंत महत्त्वाची अशी धार्मिक स्थळे भारतात आणि भारताबाहेर देखील तयार झाली. जसे उपासक वाढले तसं या पंथांमध्ये वादावादी वाढत गेली आणि याचे पर्यावसन मोठ्या युद्धांमध्ये देखील झालेले दिसते. समाजामध्ये वाढलेले हे अंतर आणि दरी कमी करण्याचे पूर्ण श्रेय जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांना जाते. कठोर साधना आणि असामान्य बुद्धिमत्ता यांच्या जोरावर त्यांनी अनेक गोष्टी साध्य केल्या. त्यातलीच एक म्हणजे संयुक्त मूर्ती - वेगवेगळ्या धार्मिक संकल्पना एकत्र करून तयार केले शिल्पं.

दक्षिणेकडील चालुक्य राजांचे एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे ऐहोळे, मंदिर स्थापत्यकलेमध्ये झालेले प्रयोग, शिल्पं आणि टेकडीवर असलेल्या मेगुती नावाच्या मंदिरात असलेला महत्त्वाचा शिलालेख यासाठी हे एहोळे प्रसिद्ध आहे. इथेच असलेल्या दुर्गा (या नावाचा संबंध देवीशी नसून दुर्ग या शब्दाचा झालेला अपभ्रंश आहे) मंदिरात हे शिल्प बघायला मिळते.

डावीकडून उजवीकडे बघताना गण (शंकराच्या सेवक वृंदांपैकी एक) दिसतो, वरचे सर्व हात तुटलेले, अप्सरा, उजवीकडच्या हातामध्ये चक्र, एक हात खाली असलेल्या पार्वतीच्या गालाला लावताना, समोर पकडलेला शंख दिसतो आहे. शंकर आणि विष्णू यांचे एकत्र रूप असलेला हा हरिहर आहे. डोक्यावर असलेल्या मुकुटाकडे नीट लक्ष देऊन बघितले तर लक्षात येईल की मुकुटाचा अर्धा भाग हा शंकराच्या जटा मुकुटाचा आहे आणि अर्धा भाग विष्णूच्या किरीट मुकुटाचा.

शिल्प आपण जेवढ्या बारकाईने बघू तेवढ्या जास्त गोष्टी आपल्याला कळत जातात. शंकर आणि विष्णू भक्तांच्या भांडणातून आद्य शंकराचार्यांनी काढलेला मार्ग हा कलेच्या रूपातून इथे अभ्यासता येतो. अशा संयुक्त मूर्तींची अजून अनेक उदाहरणे आहेत. ती आपण यथावकाश बघणाराच आहोत. आपली कला ही आपली ओळख आहे, आणि कलेमध्ये दिसणारी सर्वांना सामावून घ्यायची वृत्ती हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य!

शिल्प - हरिहर
दुर्गा मंदिर, ऐहोळे, कर्नाटक
६-७ वे शतक

 

अर्धनारीनटेश

लेख - ६

मुंबई पासून समुद्रात काही किलोमीटर आत प्राचीन भारतीय इतिहासाचा एक मोठा ठेवा लपून बसला आहे. आज जरी आपण या जागेला एलिफंटा लेणी म्हणून ओळखत असलो तरीही याचे प्राचीन नाव घारापुरी लेण्या असे होते, यापुढे आपण या वारसा स्थळाचा उल्लेख घारापुरी या प्राचीन नावानेच करणार आहोत. एलिफंटा हे नाव पोर्तुगीजांनी तिथे असलेल्या मोठ्या दगडी हत्तींकडे  पाहून दिले असावे असे मत अनेक अभ्यासकांचे आहे. १९८७ साली घारापुरी लेणी या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्या गेल्या. इथेच असलेल्या एका अत्यंत सुंदर अशा शिल्पाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. 

घारापुरी मध्ये असलेल्या लेणी ह्या मुख्यत्वे शैव म्हणजे शंकराची आराधना करणारे यांच्या आहेत त्यामुळे शंकराशी निगडित अनेक शिल्पं तिथे आपल्याला बघायला मिळतात. आकाराने खूप मोठी असणारी ही कलाकृती स्वतःच एक आशर्याची गोष्ट आहे. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज यांनी या जागेचा ताबा घेतला आणि या कलाकृती नष्ट करायची एक मोठी आघाडी उभी राहिली, भिंतीवरून आवाज चांगला येतो म्हणून शिल्पांवर बंदुकीच्या गोळ्या मारून इथे तोडफोड केली गेली. आज आपण तिथे गेलो तर हे सगळे पुरावे आणि नष्ट होत असणाऱ्या कलाकृती आपल्या काळजाचा ठेका चुकवतात. 

शंकराच्या सुप्रसिद्ध शिल्पंपैकी एक म्हणजेच शंकर आणि पार्वती याचे एकत्र असलेले अर्धनारीनटेश हे शिल्प. या संदर्भातल्या अनेक कथा आपल्याला पौराणिक ग्रंथांमध्ये बघायला मिळतात पण आज आपण त्यात न जाता या प्रचंड मोठ्या शिल्पाचा आवाका समजून घेणार आहोत. नेहमीच्या पद्धतीने हे शिल्पं बघायला सुरू करूयात. 

कमरेखालचा भाग हा नष्ट झालेला, नंदीच्या पाठीवर हात ठेऊन उभे असलेले शिव, नंदीच्या शेजारी कमळावर बसलेले ब्रह्मदेव आणि शेजारी हत्तीवर बसलेला पूर्व दिशेचा अधिपती इंद्र, वरच्या बाजूला अनेक देवदेवता आणि गंधर्व, मूळ शिल्पाच्या शरीराचा आर्धा भाग हा पुरुषाचा म्हणजेच शिव आणि अर्धा भाग, ज्यामध्ये स्तन स्पष्ट दिसते आहे तो स्त्रीचा म्हणजेच पार्वती, दोघांच्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटात देखील फरक तुम्हाला दिसेल. बाकी हात तुटले असले तरीही पार्वतीच्या हातामध्ये आरसा दिसतो आहे आणि त्या शेजारी मनुष्यरुपी गरुडावर चक्रधर विष्णू पण कोरलेले आहेत. 

आपल्याकडे असलेल्या सांख्य तत्वज्ञानात सृष्टीच्या उत्पत्तीचे श्रेय हे पुरुष आणि प्रकृती यांना दिले आहे, त्याच अवघड तत्वज्ञानाला कलाकारांनी या सुंदर आणि सोप्या अशा रचनेमध्ये प्रमाणबद्ध केले. 
ही शिल्पं आपल्याशी संवाद साधात असतात. आपले कान, डोळे आणि मन उघडे ठेऊन तो संवाद ऐकायचा प्रयत्न करूयात. 

शिल्पं - अर्धनारीनटेश
घारापुरी लेण्या - साधारण ६ वे शतक
मुंबई

महिषासुरमर्दिनी

लेख ५

आपण काही देवतांचा परिचय या आधी करून घेतला, आता भारतातल्या काही निराळ्या शिल्पांची माहिती यापुढे घेणार आहोत. महिषासुर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि अमरत्व मागितले, ते नाही मिळाले पण फक्त स्त्री कडूनच मृत्यू येईल अशी एक पळवाट मिळाली. स्त्री ही अबलाच असते असं गृहीत धरून त्याने सगळीकडे उच्छाद मांडयला सुरुवात केली. स्त्री ही अबलाच असते हे गृहीत धरणे हीच त्याची सर्वात मोठी चूक. 

महिषासुर राक्षसाचा त्रास मोठ्या प्रमाणत वाढला आणि मग विष्णू, शंकर, ब्रम्हदेव आणि इतर देवगण यांनी आपापल्या शक्तीचा वापर करून एकत्रित ताकद घडवली - हीच शक्ती म्हणजे दुर्गा. दुर्गेला हिमालयाकडून सिंह मिळाला जो अनेक शिल्पांमध्ये तिच्या बरोबर दिसतो. त्याच प्रमाणे दुर्गेला इतर देवतांकडून देखील अनेक आयुधे मिळाली. 

या लेखामध्ये उल्लेख केलेले शिल्पं हे गुजरात मध्ये पाटण जवळ राणी की वाव नावाची जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेली हेरिटेज साईट आहे तिथे आहे. मुळात राणी की वाव, हे वेगळ्या पद्धतीचे विष्णू मंदिर शिल्पांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी नंदनवन आहे. 

शिल्पनिरिक्षण - सर्वात खाली महिष (रेडा), त्याची पाठ जबड्याने पकडलेला दुर्गेचा सिंह, देवीने आपल्या पायाने दाबलेली त्या रेड्याची पाठ आणि असुराचे केस धरून रेड्याच्या मानेतून त्याला खेचून बाहेर काढलेले आहे. एका बाजूला त्रिशूळ, वज्र, बाण, भाला, डमरू, आणि मानेच्या पाठीमागे पकडलेली तलवार. तर दुसऱ्या हातात ढाल, नाग, पाश, घंटा, इत्यादी आयुधे. दुर्गेच्या डोक्यावर असलेल्या मुकुटापासून ते गळ्यातल्या माळा, मेखला, पायातील पैंजण या आणि अशा सर्वच गोष्टी परिपूर्ण असाव्यात अशाच इच्छेने कोरलेल्या आहेत. एवढे प्रचंड युद्ध होईन देखील देवीच्या चेहऱ्यावर असणारे स्मितहास्य तिच्या ताकदीची आणि पराक्रमाची चुणूक दाखवून जाते.

 

सूर्य

लेख ४ 

मित्र, रवी, भानू, हिरण्यगर्भ अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा सूर्य हा या सृष्टीच्या जीवनाचा गाभा आहे. प्रकाश देणारा, बळ देणारा आणि या अवकाशात अखंड भ्रमण करणाऱ्या या सूर्याची अनेक वेगवेगळी रूपं आहेत. अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये याला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये जे प्रमुख पाच पंथ आहेत त्यापैकी सौर्य म्हणजेच सूर्याची उपासना करणारे हा देखील आहे. इतर चार म्हणजे - वैष्णव, शैव, शाक्त आणि गाणपत्य. या सूर्याचे जे रूप आज आपल्याला शिल्पांमध्ये दिसते त्यावर भारतातल्या आणि भारताबाहेरील अनेक संस्कृतींचा प्रभाव आहे. सूर्याचे महत्त्व एवढे जास्त आहे की अगदी सुरवातीच्या जनपदांपासून ते नंतरच्या काळातील राजांच्या नाण्यांवर देखील आपल्याला चिन्हांकित सूर्य प्रतिमा बघायला मिळतात. सूर्याची शिव, वराह (विष्णू अवतार) आणि ब्रह्मदेव यांच्या बरोबर एकत्रित अंकन केलेली शिल्पं काश्मीर, वाराणसी आणि मध्य प्रदेश अशा ठिकाणी बघायला मिळतात. 

या फोटो मधील शिल्पाच्या आधाराने आपण आता सूर्याची प्रतिमा समजून घेऊयात. सर्वात खाली सूर्य सतत फिरत असतो ही संकल्पना अधोरेखित करून त्याचा रथ आणि घोडे दिसतात, यांची नावं देखील गायत्री, अनुष्टुप,पंक्ती, इत्यादी सात छंदांवर आधारलेली आहेत. सूर्याचा सारथी अरुण हातामध्ये लगाम घेऊन बसला आहे. सूर्याच्या पायात असणारे बूट हे त्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. प्रदक्षिणा मार्गाने निरीक्षण केल्यास आधी पिंगल (सूर्याचा सेवक - याने हातामध्ये दौत आणि लेखणी धरलेली असते), वरच्या हातात कमळ, माळा घेतलेले गंधर्व, डोक्यामध्ये प्रभावळ, परत हातामध्ये कमळ, आणि शेवटी शिल्पाच्या डावीकडे खाली दंड नावाचा अजून एक सेवक आपल्याला दिसतो. हातामध्ये असणारी कमळ ही सूर्य मूर्ती ओळखण्यासाठी खूप मदत करतात. सूर्याच्या पत्नी आणि मुलं यांची माहिती विष्णुधर्मोत्तर पुराणामध्ये वाचायला मिळते. याच बरोबर कूर्म आणि अग्नी या पुराणांमध्ये देखील सूर्य वर्णने लिहिलेली आहेत. 

सर्वांना प्रकाश देणाऱ्या सूर्याला थोडा उजेड आमच्याकडे देखील पाड आणि या उन्हाळ्यात दाहकता कमी कर एवढीच आम्हा सर्वांची त्या आदित्यचरणी प्रार्थना! 

शिल्प - भुबनेश्वर राज्य संग्रहालय, ओडिसा

इंद्रनील सदानंद बंकापुरे
कोल्हापूर
9960936474

 

विष्णू

लेख ३

भारतीय संस्कृतीचे अनेक पैलू आणि वैशिष्ठ्य आहेत, त्यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मूर्तींची पूजा. परकीय आक्रमणे सुरू झाली आणि आपल्याकडे होणारी वैचारिक प्रगती थांबली, यामुळेच शिल्पकला याकडे दुर्लक्ष झाले. नंतरच्या काळात परकीय अभ्यासकांनी भारतीय शिल्पांची वर्णने ही बीभत्स किंवा भयंकर शिल्पं असतात आणि यापलीकडे याला काही महत्त्व नाही अशी केली. आपले साहित्य शब्दशः भाषांतर करून मूळ मुद्द्यापासून लांब नेले. आपल्याकडच्या अनेक साहित्यिकांनी आणि अभ्यासकांनी हीच री पुढे ओढली. पण डेक्कन कॉलेज चे सांकलिया सर, डॉ. नि. पु. जोशी, डॉ. देगलूरकर, डॉ. जामखेडकर, डॉ. ढवळीकर, किरीट मंकोडी अशा अनेक अभ्यासकांनी या कलेच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. कै. उदयन इंदूरकर सारख्या माणसांनी जनमानसात हा विषय रुजवला.
शिल्प किंवा मूर्ती हे आपल्याकडे साध्य नसून साधन आहे त्या पाठीमागे लपलेल्या संकल्पनेला समजून घेण्यासाठीचे. तीन महत्त्वाच्या देवांपैकि एक म्हणजे विष्णू. भारतात आणि भारताच्या बाहेर देखील याचे अनेक उपासक आहेत. जगातले सगळ्यात मोठे विष्णू मंदिर हे भारतात नसून बँकॉक पासून जवळ असलेल्या कंबोडिया नावाच्या देशात आहे. मूर्तीच्या मागे लपलेल्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर आधी ती मूर्ती समजून घेणे गरजेचे आहे. या फोटो मध्ये असलेला विष्णू आता बघुयात. डावीकडून बघताना हातामध्ये कौमोदकी नावाची गदा दिसते, पांचजन्य शंख, डोक्यावर प्रभावळ आणि किरीट मुकुट, पद्म किंवा कमळ आणि सुदर्शन चक्र अशी आयुधे आहेत. छातीवर श्रीवत्स नावाचे चिन्ह दिसते आहे. 'अहिर्बुध्न्य संहिता ' नावाच्या उपनिषद ग्रंथात विष्णूच्या हातांचा आणि आयुधांचा नक्की अर्थ काय आहे याचे वर्णन आले आहे. विष्णू हा मत्स, कुर्म, वराह, वामन, इत्यादी अनेक अवतरांमध्ये दिसतो. भक्तीचे महत्त्व समाजात पसरवण्याचे खूप मोठे श्रेय हे या वैष्णव संकल्पनेला जाते.

मूर्ती - संकर्षण (विष्णू)
दिल्ली नॅशनल मुझियम


गणपती

आपल्याकडे कुणीही एखादे चांगले काम सुरू केले की आपण कामाचा श्रीगणेशा झाला असं म्हणतो, शुभकार्यात गणपतीला विशेष मान आहे, माझ्यासारख्या पोटासाठी जगणाऱ्या लोकांसाठी गणपतीचे मोदक हे त्याच्यावर प्रेम करण्यासाठी मिळालेले अजून एक कारण! 😊

या मालिकेची सुरुवात देखील आपण श्रीगणेशाने करणार आहोत. मंदिरांवर मोठ्या प्रमाणात कोरल्या गेलेल्या देवांपैकी हा एक देव आहे. समृद्धी आणि ज्ञान यांचे लक्षण असलेली ही देवता ओळखण्यासाठी सोपी आहे. कुठलाही देव किंवा शिल्पं ओळखण्यासाठी काही प्रमाणे आहेत,
१. हातामध्ये असलेली आयुधे
२. शरीराची ठेवण, रचना
३. वाहन
४. मुकुट, केश आणि इतर दागिने
गणपतीच्या हातामध्ये खालील आयुधे प्रामुख्याने दिसतात - अक्षमाला, पाश, दंड, मोदकपात्र, भग्न - दंत, अंकुश आणि परशू. गणपतीला प्रामुख्याने ४ हात दाखवलेले असतात पण अनेक ठिकाणी २ किंवा ८ हातांचा गणेश देखील बघायला मिळतो. पायाशी त्याचे वाहन - मूषक (उंदीर) देखील कोरलेला असतो. 

शिल्पाचे वर्णन किंवा निरीक्षण करताना ते क्लॉकवाइज केल्यास मूर्ती समजणे सोपे जाते. या फोटो मधल्या गणपतीचे निरीक्षण करूयात. पाय दुमडून बसलेला गणपती, लेखणी सारखा पकडलेला भग्न दंत, हात तुटलेला, पद्म, मोदकपात्र, पायात उंदीर (उंदराचे कान दिसतात). अंगात सर्प यज्ञोपवित परिधान केले आहे. 
कपाळावर असलेल्या आठ्या, वर गेलेल्या भुवया आणि बारीक झालेले डोळे हे एकाग्रता दर्शवतात, का बरं एवढं एकाग्र होऊन बसावे लागले असेल गणपतीला? 
व्यासांनी महाभारत लिहिण्याचा घाट घातला आणि गणपतीला लेखनिक होण्याची विनंती केली, देवच तो.. रागावला. म्हणाला ठीक आहे, पण एका अटीवर, मी एकदा लिहायला सुरू केले की थांबणार नाही. समोर व्यास होते, म्हणाले अट मान्य, पण माझी पण एक अट आहे. प्रत्येक श्लोक समजून घेऊन मगच लिहायचा. लिखाण सुरू झालं, मध्येच व्यास एखादा कुट श्लोक (कोडं) सांगायचे आणि ते सोडवायला गणपतीला बराच वेळ लागायचा आणि त्या वेळात ते पुढचे श्लोक रचायचे, ना गणपती थांबले ना व्यास... आणि महाभारत तयार झालं. हे शिल्प त्या कलाकाराने तो महाभारत लिहिणारा गणपती डोळ्यासमोर ठेऊन कोरले असावे. 
या कथा कायम काहीतरी शिकवायचा प्रयत्न करत असतात. काही मिळतंय का बघा! 

शिल्पाचे ठिकाण - छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, मुंबई

 

रानी की वाव - पाटण - गुजरात


     रानी की वाव

 दक्षिण भारतात समुद्राच्या सीमा ओलांडून चोल राजे आपला पराक्रम गाजवत होतेमहाराष्ट्रात यादवांचं राज्यं अत्यंत बळकट होतं त्याचवेळेला गुजरात मध्ये सोळंकी घराण्याचा विस्तार वाढत होताया घराण्यानी केलेल्या सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीमुळेसोळंकी साम्राज्याच्या सीमा सर्वदूर पसरण्यासाठी खूप मोठी मदत झालीयाच काळात भारतभरात विविध राजघराणी अनेक सुंदर सुंदर स्थापत्य उभी करत होती.  स्टेप-वेल (पायऱ्या असलेली विहीरअशी साधी वाटणारी  संकल्पना काळाच्या ओघात अत्यंत अवघड पण खूप सुंदर अशा स्थापत्य शैलीमध्ये परावर्तित झालेली दिसते.  धोलावीरा इथे झालेल्या उत्खननात अशा प्रकारचं स्थापत्य आपल्याला बघायला मिळतंपाण्याच्या साठ्यापर्यंत जाण्यासाठी केलेली मानवनिर्मित सोय या सुरवातीच्या कल्पनेपासून या स्थापत्याचा मंदिरापर्यंतचा प्रवास आपल्याला गुजरात मध्ये बघायला मिळतो.
राणी उदयनमती हिने सोळंकी राजा आणि पती भीमदेव (पहिलायाच्या स्मरणार्थ पाटण येथेसरस्वती नदीच्या  काठी  हे स्थापत्य घडवायचा निर्णय घेतलाअकराव्या शतकात तयार झालेली हि रानी की वाव १९६० सालापर्यंत संपूर्णपणे नदीच्या पाण्याने आणि गाळाने भरलेली होती आणि कदाचित म्हणूनच परकीय आक्रमकांच्या नजरेतून हे स्थापत्य वाचलेभारतीय पुरातत्व खात्याने उत्खनन करून हे सांस्कृतिक वैभव आपल्या सर्वांसाठी मोकळे केलेयुनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या जागेचा समावेश होतो.
पूर्वाभिमुख रचना असलेले हे स्थापत्य ६० मीटर लांब२० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहेचार भागांमध्ये विभागले गेलेले हे स्थापत्य अत्यंत सुंदर अशा शिल्पांची अलंकृत आहेखांबांच्या आधाराने बाल्कनी करूनवेगवेगळ्या उंचीवर आणि वेगवेगळ्या आकारात हे विभाजन केले आहेयापैकी सर्वात खालचे दोन भाग हे नैसर्गिक कारणांमुळे झालेले नुकसान आणि अतिउत्साही पर्यटक यामुळे बंद केले आहेतपूर्वेकडून या विहिरीत उतरायला पायऱ्या बांधल्या आहेत तर पश्चिमेची बाजू ही डोंगराच्या कड्यासारखी सरळ असून त्यावर शेषशायी विष्णू मूर्ती कोरल्या आहेत
रानी की वाव मध्ये विष्णू आणि विष्णूचे अवतारशिवदुर्गाभैरवसुरसुंदरीयोगिनी अशी अनेक शिल्पं कोरली आहेतयापैकी काहींचा परिचय इथे करून घेऊयात.
भैरव
शंकराच्या रौद्र रूपांपैकी एक म्हणून भैरव समजला जातोअनेक पुराणांमध्ये या संदर्भातल्या कथा आपल्याला वाचायला मिळतातया ठिकाणी असलेला भैरव हा १८ हातांचा आहेवरच्या दोन हातांमध्ये पकडलेला सापउजवीकडच्या हातांमध्ये असलेलं खङगडमरू आणि तिथेच खाली प्रेताचा हात खाणारा एक गण दिसतोडावीकडे खालच्या हातात केसांना धरलेलं डोकं आणि ते चाटणारं कुत्रं कोरलं आहेबीभत्स तरीही सुंदरअत्यंत बारकाईने कोरलेली केशरचनागळ्यातले दागिने आणि कमरेच्या वस्त्रावर कोरलेली नक्षी लक्ष वेधून घेते.




वराह
विष्णूच्या दशावतारांपैकी हा तिसरा अवतार मानला जातोया मूर्तीच्या स्थापनेमुळे राज्यप्राप्ती होते असे संदर्भ आपल्याला अग्नीपुराणात बघायला मिळतातहिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला समुद्रात लपवले आणि विष्णू वराहाच्या रूपाने प्रकट झालेत्या राक्षसाचा संहार केला आणि पृथ्वीला वाचवले अशी ही कथा आहेइथे असलेली मूर्ती ही शिल्पशास्त्राचे खूप सुंदर उदाहरण म्हणून बघता येईलकमळावर पाय ठेऊन उभा असलेलाशंखचक्र आणि गदा धारण केलेलात्यानं जीला वाचवलं ती पृथ्वी कोपऱ्यातून दुमडलेल्या त्याच्या हातावर बसलेली आहेअसा ताठ उभा असलेला हा वराह अत्यंत रुबाबदार दिसतोकमरेत खोचलेलं खंजीर आणि वस्त्रांवरचं नक्षीकाम कलाकारांनी खूप सुंदर केलं आहेया मूर्तीच्या बाजूला छोट्या छोट्या देवकोष्ठांमध्ये विष्णूची इतर रूपे कोरली आहेत.

 

ओडिसा : परशुरामेश्वर आणि मुक्तेश्वर




लोककला, संस्कृती, नृत्य, कापडावराची कलाकुसर यांनी ओळखला जाणारा, भारताच्या पूर्वेला आणि बंगाल उपसागराच्या किनारी वसलेला सुंदर प्रदेश म्हणजे ओरिसा! पण या प्रदेशाची ओळख एवढ्यापुरती मर्यादित नक्कीच नाही. अगदी २२००-२३०० वर्षांपूर्वीचे कला, स्थापत्य आणि मूर्तींचे पुरावे आपल्याला या भागात सापडतात. मौर्य सम्राट अशोकाच्या कलिंग युद्धात रक्तबंबाळ झालेला हा प्रदेश, इसवीसन पूर्व पहिल्या शतकापासून जैन आणि बौद्ध गुहांनी नटलेला हा प्रदेश आणि सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत अत्यंत सुंदर आणि प्रचंड मोठी मंदिरे बांधली गेलेला हा प्रदेश.

ढोबळमानाने उत्तरेकडे असलेल्या मंदिरांना नागर प्रकारची मंदिरे म्हणतात. ओडीसा मधली मंदिरे नागर शैलीची म्हणता येतील, पण सुरवातीपासूनच तिथे एक प्रादेशिक शैलीचा विकास होत होता, आणि हि उपशैली “कलिंग शैली” म्हणून ओळखली जाऊ लागली. जसं जसं आपण एकेका मंदिराबद्दल जाणून घेऊ तेंव्हा या शैलीचा नीट विचार करू.
इसवीसनाच्या सातव्या शतकात बांधलं गेलेलं ओरिसा मधलं पहिलं  मंदिर – परशुरामेश्वर !

आपण मंदिराच्या ज्या भागाला मंडप असं म्हणतो त्यालाच तिकडे ‘जगमोहन’ असं म्हणतात, गाभाऱ्याच्या वर असलेल्या शिखराला रेखा देऊळ तर मंडपाच्या  (जगमोहनाच्या) वर असलेल्या शिखराला पिढा देऊळ म्हणतात.

या मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी त्याच्याभोती आयताकृती भिंत बांधली आहे आणि अशी रचना ओरिसा मधल्या अनेक मंदिरांमध्ये बघायला मिळते.

या मंदिरातली शिल्पं खूप सुंदर आहेत. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर समोरच गर्भगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर गणपती कोरला आहे. आकाराने जरी हे मंदिर थोडं लहान असलं तरीही यावर शिल्पं मोठ्या प्रमाणात कोरली गेली आहेत. जगमोहनात (मंडपात)  प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या वर शंकराची उपासना करणारे साधक कोरले आहेत आणि दुसऱ्या दाराच्या वरच्या भागात अभिषेकलक्ष्मी कोरली आहे.

जैन, बौद्ध यांनी सुद्धा ‘अभिषेकलक्ष्मी’ या शिल्पाचा मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्थापत्यामध्ये वापर केलेला आढळून येतो. कमळावर बसलेल्या लक्ष्मीला दोन सुशोभित हत्ती दोन्ही बाजूनी अभिषेक करत आहेत असे हे शिल्प आहे.
जगमोहनाच्या भिंतीवर एका बाजूला गणपती आणि एका बाजूला वीरभद्र यांच्यामध्ये कोरलेल्या अष्टमातृका सुद्धा बघण्यासारख्या आहेत.

अष्टमातृका : अष्टमातृका किंवा सप्तमातृका या देवांच्या सिद्धी किंवा त्यांची शक्ती होत. प्राचीन काळापासून मातृका पूजनाचे पुरावे आपल्याला मिळतात. ब्रम्हाणी/ब्राम्ही (ब्रह्म), माहेश्वरी (शिव), कौमारी (कार्तिकेय), वैष्णवी (विष्णू), वाराही (वराह अवतार), इंद्राणी (इंद्र), चामुंडा आणि आठवी लक्ष्मी म्हणून सांगितली आहे.
याचबरोबर महिषासुरमर्दिनी, उमा-महेश्वर, कार्तिकेय यांची शिल्पं सुद्धा अत्यंत सुंदर कोरलेली आहेत.

परशुरामेश्वर मंदिराच्याच जवळ त्यानंतर बांधलं गेलेलं मुक्तेश्वर मंदिर आहे.


 काही अभ्यासकांच्या मताप्रमाणे सोमवंशी घराण्यातील पहिल्या काही राजांपैकी एक म्हणजे ययाती (पहिला) त्याने हे मंदिर बांधले. ओरिसा मंदिर स्थापत्य आणि मुर्तीशास्त्र या दोन्हीच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे आणि तेवढेच सुंदर असे हे मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश करताना एका मोठ्या तोरणातून प्रवेश करावा लागतो जे अखंड कोरीव काम केलेल्या दोन खांबांवर स्थिरावलेले आहे. या मंदिराच्या भोवती कोरीवकाम केलेला सरंक्षण कठडा बांधला आहे.
मुक्तेश्वर मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या जगमोहानात खांब नाहीत आणि आतून व बाहेरून या भिंती कोरीव कामाने सजवलेल्या आहेत.

वरच्या दोन हातात पकडलेला नाग, एका हातात डमरू तर दुसऱ्या हातात त्रिशूळ, चेहऱ्यावर शांत भाव आणि एका हाताने पार्वतीच्या गालाला केलेला स्पर्श असं हे नटराजाचं शिल्पं तिथल्या कलाकारांच्या प्रतिभेचा पुरावा म्हणून पुरेसं आहे.
या मंदिरावर माकड आणि मगर यांच्या पंचतंत्रातल्या कथा सुद्धा कलाकारांनी कोरून ठेवल्या आहेत. जगामोहानाच्या आतल्या बाजूला छतावर कोरलेल नृत्य गणेश, शेजारी मोर असलेला कार्तिकेय नीट बघितल्याशिवाय दिसत नाहीत.

मंदिर स्थापत्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं हे मुक्तेश्वर मंदिर, कलिंग मंदिर स्थापत्य शैलीच्या विकासातील एक महत्वाचा टप्पा आहे.

 

वारसा स्थळे का बघावीत?


संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा, लिपी,साहित्य, कला, शिक्षण, तत्वज्ञान, राजकारण, व्यापार या आणि अशा अनेक गोष्टी आपल्या समाजाला आकार देत असतात. यात सगळ्यात महत्वाचा असतो तो आपला इतिहास. भविष्याची जडणघडण नीट होण्यासाठी भूतकाळाची माहिती असणे आवश्यक ठरते. 

जगात इजिप्शियन, रोमन, ई. सारख्या अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि लोप पावल्या. अनेक संस्कृती अशा आहेत ज्यांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा या निव्वळ काही लेखी उल्लेख आलेत तिथे जाणवतात. पण हे सगळं आमचं आहे, हे आमच्या पूर्वजांनी केलंय असं म्हणणारे लोक आज तिथे भेटत नाहीत. 

भारतीय उपखंडात तयार झालेली, टिकलेली वैशिष्ट्य पूर्ण संस्कृती ही आमची आहे हे आज आपण अभिमानाने सांगतो. आपल्या घरी काढली जाणारी रांगोळी, साजरा केले जाणारे वेगवेगळे सण, घरी म्हणतो त्या आरत्या इथपासून ते गुहांमधली चित्रे, लेण्या, मंदिरे, विहार, संस्कृत - पाली साहित्य, दाक्षिणात्य साहित्य, कला, संगीत हे सगळं आपलं आहे, याची साक्ष देतात. आपल्यावर अनेक संकटं आली, परकीय आक्रमणे झाली, पण त्या सगळ्यांना आपलं करून, इथलेच एक बनवून संस्कृतीचा पाया घट्ट ठेवला. 


या अशा हजारो वर्षे आपली ओळख नं गमावता, आपल्या मुळांना नीट सांभाळून ठेवलेल्या संस्कृतीची माहिती आपल्या सगळ्यांना असणं ही आजची गरज आहे. जो पाया आपल्याला आज उभ्या असलेल्या समाजाला आधार देतो तो समजून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. 

आपल्या संकल्पना, तत्वज्ञान, साहित्य हे खूप काळ साठवून ठेवायचं असेल तर ते सर्वसामान्य लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे. हाच विचार लक्षात घेऊन भारतीय इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा, सुंदर आणि भन्नाट प्रयोग सुरू झाला.... भारतीय मंदिरे! 


अगदी छोट्या मंदिरापासून ते शेकडो फूट उंच कळस असलेल्या मंदिरांची निर्मिती केली गेली, एकाच पाषाणात प्रचंड मंदिरे कोरली गेली ज्याला मोनोलिथ म्हणतात, ईशान्य भारताच्या दऱ्याखोऱ्यात, हिमालाच्या कुशीत, समुद्राच्या किनाऱ्यावर आणि राजस्थान - गुजरात यांच्या वाळवंटात असे संपूर्ण भारतभर ह्या यशस्वी प्रयोगाची रचना झाली. भारताच्या बाहेर सुवर्ण द्वीसमूह म्हणजे आजचे इंडोनेशिया, बाली, सुमात्रा, कंबोडिया अशा देशांमध्ये आपल्या संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार झाला. 

भारतीय कलेच्या आधाराने भारतीय संस्कृती समजून घेण्याचा हा प्रयोग आहे. मंदिरे ही फक्त नमस्कार करण्यासाठी नसून ती ज्ञानाची केंद्र आहेत हे समजावून देण्याचा हा प्रयत्न आहे. 

धन्यवाद!

 

 

सप्तमातृका

 

प्रागैतिहासकालापासून मानवाने मातृदेवतांचे पूजन केले आहे आणि त्याचे पुरावे उत्खननात मूर्त्यांच्या रुपात सापडले आहेत. साधारणपणे २५००० वर्षांपूर्वी उत्तर पुराश्मयुगीन मानव स्त्रीदेवतेची पूजा करत होता हे बागोर (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या उत्खननात आढळून आले. येथे केलेल्या उत्खननात गोलाकार कट्ट्यावर त्रिकोणी आकाराचा दगड आढळून आला. या दगडावरील त्रिकोणी चिन्ह कोरलेले नसून नैसर्गिक आहे. तेथील बैगा आणि कोल जमातीच्या स्त्रिया अशा प्रकारच्या दगडांची पूजा कढाई-की-देवी या नावाने करतात. ही देवी आरोग्याचे आणि सुफलनाचे प्रतिक मानली जाते. सिंधू संस्कृतीच्या अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननात मातृदेवतांच्या स्त्री-मूर्ती सापडलेल्या आहेत. त्याचबरोबर एका सिंधू मुद्रेवर कोरलेल्या सात स्त्रियांचे शिल्पांकन महत्त्वाचे ठरते, कारण सप्तमातृकांचा तो सर्वात जुना पुरावा असावा.

सप्तमातृकांच्या उत्पत्तीबद्दल पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा सांगितल्या आहेत. महाभारतातील कथेनुसार प्रल्हादानंतर सत्तेवर आलेल्या अंधकासुराला मारण्यासाठी प्रमुख देवतांनी आपली शक्ती निर्माण करून त्यांना युध्दात पाठवले. कुर्मपुराणानुसार अंधकासुर मारला गेल्यानंतर भैरवाने ह्या मातृकांना पाताळात पाठवले. परंतु ह्या मातृकांनी स्वतःची भूक भागवण्यासाठी सर्वत्र हाहाकार माजवण्यास सुरुवात केली. त्यांना शांत करण्यासाठी भैरवाने नरसिंहाची प्रार्थना केली आणि नंतर नरसिंहाने पाताळात जाऊन मातृकांना शांत केले. सुप्रभेदागम ग्रंथानुसार निर्रिता राक्षसाचा वध करण्यासाठी ब्रम्हाने सप्तमातृकांची निर्मिती केली. देवीने केलेल्या सिंहनादापासून सप्तमातृकांची उत्त्पती झाली अशी कथा वामनपुराणामध्ये सांगिलते आहे. मार्कंडेयपुराणानुसार अंबिका व चामुंडा यांनी रक्तविज राक्षसाला युध्दात मारून टाकले. या युध्दात इतर मातृकांनी अंबिका व चामुंडा यांना मदत केली होती. सप्तमातृकांचा उल्लेख ऋग्वेद, गोभिलस्मृती, मत्सपुराण, वराहपुराण इ. धार्मिक ग्रंथात वाचायला मिळतो.

सप्तमातृका ह्या प्रमुख देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृकांची संख्या सुरुवातीच्या काळात ७ किंवा ८ होती. पण पुढील काळात त्यांची संख्या १६, ३२ आणि ६४ अशी बघायला मिळते. देवी भागवतांत ३२ मातृकांची यादी दिलेली आहे. ब्रह्माची ब्राह्मी/ब्रह्माणी, इंद्राचीइंद्राणी/ऐन्द्री, महेशाचीमाहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा या प्रमुख देवतांच्या शक्ती. त्याशिवाय शिवदूती, नारसिंही, योगेश्वरी, काली, वारुणी आणि वैनायकी या मातृकांचे संदर्भसुध्दा विविध पुराणांमध्ये वाचायला मिळतात.

भारतातील सर्वात जुना सप्तमातृकापट मथुरेजवळील धनगाव येथे सापडला. हा शिल्पपट कुषाणकालीन असून सद्यस्थितीत मथुरा संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. यातील मातृकांचा उजवा हात अभयमुद्रेत आणि डाव्या हातात कमंडलु धरलेला आहे. ह्या सर्व मातृका कोणत्याही आयुधाशिवाय आणि वाहनाशिवाय आहेत. कुमारगुप्त पहिला याचा मांडलिक विश्ववर्मन याच्या गंगाधर शिलालेखानुसार (सन ४२३-४२४) विश्ववर्मन याने मातृदेवतेचे मंदिर उभारले होते. बदामी येथील चालुक्य राजवंश सप्तमातृकांची पूजा करत होते आणि त्यांचे शिलालेख ह्या गोष्टीची साक्ष देतात.

सुरुवातीच्या काळात कोणत्याही वाहन आणि आयुधाशिवाय असलेल्या मातृकांच्या मूर्तिशास्त्रात हळूहळू बदल होत गेले. मातृका ह्या प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे आणि शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे, त्यांच्या मूर्तीस्त्रीरुपात घडवल्या जातात. प्रमुख देवतेची मातृका प्रमुख देवतेसारखीच असली पाहिजे, तसेच मातृका बसलेल्या असाव्यात, त्यांना चार हात असावेत, त्यापैकी उजवा हात अभयमुद्रेत, डावा हात वरदमुद्रेत आणि उरलेल्या दोन हातात प्रमुख देवतेची आयुधे असावीत असे तसेच सुप्रभेदागम या ग्रंथात सांगितले आहे. सप्तमातृकांच्या मुर्त्या दिसायला एक सारख्याच असतील, तर अशावेळी त्यांच्या वाहनांवरून आणि आयुधांवरून मातृकांची ओळख ठरवता येते. काही शिल्पपटांमध्ये मातृकांच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी मातृत्वाचे प्रतिक म्हणून लहान मुले दाखवली आहेत. गुप्तकाळापासून सप्तमातृका शिल्पपटात सुरुवातीला वीरभद्र (शिव) आणि सर्वात शेवटी गणपतीचे अंकन करण्यास सुरुवात झाली. अनेकदा वीरभद्र वीणावादन करताना दाखवलेला असतो. सप्तमातृका पटाशिवाय वैष्णवी, इंद्रायणी, माहेश्वरी, वाराही, चामुंडा, वैनायकी इ. मातृकांच्या स्वतंत्र प्रतिमासुध्दा बघायला मिळतात. शिवाशी निगडीत असल्यामुळे शैवमंदिरात किंवा शैवलेण्यात सप्तमातृकांचे शिल्पांकन अनेकदा बघावयास मिळते.

ब्रह्माणी: हिला चार मुखे असून अंग सुवर्णासारखे तेजस्वी असते. उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात अक्षयसूत्र आणि दुसऱ्या हातात कमंडलु असते. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच तिच्या डोक्यावर करंडमुकुट असतो. ब्रह्माणी लाल रंगाच्या कमळावर बसलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: हंस

वैष्णवी: उजवा हात अभय मुद्रेत, डावा हात वरद मुद्रेत आणि पाठीमागील एका हातात चक्र आणि दुसऱ्या हातात शंख असतो. हिने पिवळे वस्त्र (पितांबर) परिधान केलेले असते. तसेच डोक्यावर किरीटमुकुट असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: गरुड

इंद्राणी: इंद्राणीला चार डोळे आणि चार हात असतात. उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असून इतर दोन हातात वज्र आणि शक्ती धारण केलेली असते. हिचा रंग लाल असून डोक्यावर किरीट असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: ऐरावत/हत्ती

माहेश्वरी: हिला चार हात असून उजवा हात आणि डावा हात अनुक्रमे अभय मुद्रेत व वरद मुद्रेत असतो. इतर दोन हातात शूल आणि अक्षमाला धारण केलेली असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: वृष/बैल

कौमारी: चार हातांपैकी उजवा हात अभय मुद्रेत आणि डावा हात वरद मुद्रेत असतो, तर इतर दोन हातात शक्ती आणि कोंबडा असतो. वाहन आणि ध्वजचिन्ह: मोर

वाराही: हिचे मुख वराहासारखे असून डोक्यावर करंडमुकुट असतो. तिच्या हातात हल आणि शक्ती असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. वाहन आणि ध्वजचिन्ह: महिष

चामुंडा: इतर मातृकांपेक्षा हिचे शिल्पांकन भयावह असते. केस विस्कटलेले असतात. डोळ्यांचा रंग लाल असतो. हातात कपाल आणि शूल असून इतर दोन हात अभय व वरद मुद्रेत असतात. यज्ञोपवीत म्हणून मुंडक्यांची माला आणि मुंडक्यांचा मुकुट धारण केलेला असतो. छातीच्या बरगड्या दिसत असतात, स्तन ओघळलेले असून सुळे बाहेर आलेले असतात. कधीकधी हिच्या पोटावर विंचूचे शिल्प असते. वाहन आणि ध्वजचिन्ह: गिधाड/कावळा/शव

वेगवेगळी पुराणे सप्तमातृकांच्या उत्त्पतीबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वराहपुराण त्यांचा संबंध आठ मानवी दोषांशी जोडतो. वराहपुराणानुसार योगेश्वरी, माहेश्वरी, वैष्णवी, ब्रह्माणी, कौमारी, इंद्राणी, चामुंडा आणि वाराही या मातृका अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, पैशून्य(पशुत्व) आणि असूया या दोषांची प्रतिके आहेत.

 

  • घारापुरी लेणी
  • वेरूळ लेणी (भव्य आकारातील मातृका)
  • वाडेश्वर मंदिर, अंभई (ललाटबिंबावर सप्तमातृका)
  • भुलेश्वर मंदिर, यवत (वैनायकी मातृका)
  • पाटेश्वर मंदिर व लेणी परिसर (अष्टमातृका)
  • धर्मापुरीचा किल्ला, धर्मापुरी
  • औंढ्या नागनाथ मंदिर, औंढ्या नागनाथ
  • दाशरथेस्वर मंदिर, मुखेड (नृत्य करण्याऱ्या सप्तमातृका)
  • छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई
  • जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी-मुंबई
  • राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे
  • टाकळी ढोकेश्वरची लेणी

संदर्भ:

  1. भारताची कुळकथा, डॉ. मधुकर केशव ढवळीकर
  2. भारतीय मूर्तिशास्त्र, डॉ. नी. पु. जोशी

– स्नेहल आपटे

भैरव हा नग्न असतो हातात नर मुंड असते व त्याचे रक्त पिणारा कुत्रा दाखवला जातो तसे या मूर्ती मध्ये नाही...या मूर्तीतील आयुध हे ढाल तलवार त्रिशूळ दिसत आहेत मूर्तीस मिषा आहेत एकूण च हे वीरभद्र आहे भैरवनाथ असते तर त्यांचे वाहन कुत्रा शेजारी दिसला असता, वीरभद्र यांचे मुर्ती आहे..

Vishnu Murti found underground Kalubai temple Kalyan Sinhgad. At base of Shingad fort.does any know about it?

आग्नेय आशियातील विष्णुमूर्ती...

सकाळ वृत्तसेवा

- आनंद कानिटकर kanitkaranand@gmail.com

आग्नेय आशियामध्ये शंकरासोबतच विष्णूची उपासना किमान दीड हजार वर्षांपूर्वी सुरू झाली होती, हे तेथील शिलालेख आणि मूर्तींच्या पुराव्यांवरून लक्षात येते. त्यातील काही मोजक्या आणि महत्त्वाच्या मूर्तींची ओळख आजच्या लेखात करून घेणार आहोत.

आपल्या देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात कुशाण राजवंशाच्या काळातील (आजपासून सतराशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती आढळलेल्या आहेत. त्यानंतर आलेल्या गुप्त राजवंशाच्या काळातील (आजपासून सोळाशे वर्षांपूर्वीच्या) विष्णुमूर्ती मध्य प्रदेशातील उदयगिरी लेण्यांत किंवा मथुरा इथे सापडल्या आहेत. या आपल्या देशातल्या प्राचीन विष्णुमूर्ती आहेत. याच काळात शैव आणि वैष्णव पंथ आताच्या भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून आग्नेय आशियातील थायलंड, कंबोडिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचले. भूतलावरील राजा हा सृष्टीचे पालनपोषण करणाऱ्या विष्णुसमान किंवा विष्णूचा अवतार आहे ही भारतीय संकल्पनासुद्धा आग्नेय आशियातील या देशांमध्ये दिसून येते.

थायलंड : आग्नेय आशियात सापडणाऱ्या सर्वांत प्राचीन विष्णुमूर्तींपैकी एक विष्णुमूर्ती आपल्याला थायलंडमध्ये सापडते. दक्षिण थायलंडमधील चैय्या इथे सापडलेली ही विष्णुमूर्ती भारतातील कुशाण आणि गुप्त राजवंशाच्या काळातील मूर्तींशी साम्य दाखवणारी आहे. इसवीसन चौथ्या/पाचव्या शतकात म्हणजे आजपासून सोळाशे ते पंधराशे वर्षांपूर्वी ही मूर्ती तयार करण्यात आली होती.

ही मूर्ती चतुर्भुज विष्णूची आहे. या मूर्तीत विष्णूच्या मस्तकावर किरीट असून कानात मोठी कुंडलं आहेत. मूर्तीचा मागील डावा हात तुटलेला असून मागील उजव्या हाताने गदा धरलेली आहे. पुढील उजवा हात अभय मुद्रेत असून पुढील डाव्या हातात शंख धरलेला आहे. अशा पद्धतीने कमरेपाशी शंख धरलेल्या भारतातील कुशाण राजवंशाच्या आणि गुप्त राजवंशाच्या काळातील विष्णुमूर्ती उत्तर भारतात आढळून आलेल्या आहेत.

काही अभ्यासकांच्या मतानुसार चैया येथील ही विष्णुमूर्ती म्हणजे आग्नेय आशियातील आता उपलब्ध असलेली सर्वांत प्राचीन विष्णूमूर्ती आहे. इसवीसनाचे चौथे शतक किंवा पाचवे शतक या दरम्यानच्या कोणत्या काळात ही मूर्ती घडवण्यात आली असावी, याबद्दल अभ्यासकांत मतमतांतरे आहेत. काही असले तरी भारतातील विष्णुमूर्तीचा प्रचंड प्रभाव असणारी ही आग्नेय आशियातील महत्त्वाची मूर्ती आहे, हे नक्की. याशिवाय थायलंडमध्ये इतरही अनेक ठिकाणी विष्णूमूर्ती सापडल्या आहेत. थायलंडमधील प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील तेथील शैव आणि वैष्णव पंथांचा प्रभाव तेथील हिंदू मंदिरे आणि देवतांच्या मूर्तींवरून लक्षात येतो.

कंबोडिया : कंबोडियातील सोळाशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखांतूनसुद्धा विष्णुमंदिरांना दिलेली दानं नमूद केलेली आहेत. त्या काळातील काही विष्णुमूर्तीदेखील सापडल्या आहेत. मात्र विष्णुभक्तीचा कळस आपल्याला अंकोरवाट नावाने प्रसिद्ध असणाऱ्या मंदिरात बघायला मिळतो. हे मंदिर कंबोडियातील सूर्यवर्मन (दुसरा) या राजाने बाराव्या शतकात बांधलं. तेथील शिलालेखांत या राजाचे नाव परमविष्णुलोक असे नोंदलेले आहे. या मंदिरातील समुद्रमंथनाचे शिल्प अत्यंत प्रसिद्ध आहे. समुद्रमंथनाच्या या शिल्पात कुर्मावतारासह विष्णूची मूर्तीदेखील पहायला मिळते.

या मंदिराशिवाय अंकोरच्या परिसरात थोम्मानन, बांते सम्रे इत्यादी विष्णुमंदिरं आढळून येतात. या सर्व मंदिरांवरील शिल्पांमध्ये आपल्याला विष्णू, राम, कृष्ण यांच्या मूर्ती आणि त्यांच्याशी संबंधित कथांची शिल्पं कोरलेली आढळतात. कंबोडियामध्ये विष्णूच्या दगडी शिल्पांखेरीज ब्राँझच्या मूर्तीदेखील सापडल्या आहेत. यातील आठशे वर्षांपूर्वीची गरुडारूढ विष्णूची एक मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कंबोडियातील अनेक मंदिरांच्या भिंतीवर आढळणाऱ्या गरुडारूढ विष्णूच्या दगडी मूर्तींसमान ही ब्राँझची मूर्ती घडवलेली आहे.

व्हिएतनाम : मध्य आणि दक्षिण कंबोडियातील वैष्णव पंथाचा प्रभाव व्हिएतनाममध्येदेखील पडला होता. त्यामुळे व्हिएतनाममध्येदेखील इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून विष्णुमूर्ती निर्माण केल्या जात होत्या. येथील एका विष्णुमूर्तीच्या वरील दोन हातांत शंख आणि चक्र दिसून येते. तर खालील डावा हात हा गदेवर ठेवलेला आहे. या मूर्तीत विष्णूचे कुरळे केस दाखवले असून मस्तकावर किरीट आहे.

ही विष्णुमूर्ती साधारणपणे तेराशे वर्षांपूर्वीची आहे. या मूर्तीच्या अंगावर कोणतेही दागिने कोरलेले नाहीत. त्या काळी कंबोडिया, व्हिएतनाम येथील मूर्तींना कानातील, गळ्यातील सोन्याचे दागिने घातले जात असत, हे तेव्हाच्या शिलालेखांवरून समजते. व्हिएतनाममधील या मूर्ती अत्यंत प्रमाणबद्ध आणि सुरेख पद्धतीने घडवलेल्या आहेत. व्हिएतनाममधील मी सन या प्राचीन शैव तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शेषशायी विष्णूची मूर्तीदेखील सापडली होती, याबद्दल आपण व्हिएतनामवरील एका लेखात बघितले आहे.

इंडोनेशिया : इंडोनेशियातील प्राचीन हिंदू मूर्तींमध्ये काही विष्णुमूर्तीदेखील आहेत. इंडोनेशियातील जावा बेटावर सापडलेल्या विष्णुमूर्तींपैकी एका मूर्तीवर वर उल्लेख केलेल्या थायलंडमधील चैय्या येथील मूर्तीचा प्रभाव आहे. तर येथेच सापडलेल्या दुसऱ्या एका विष्णुमूर्तीत अधिक कोरीव काम केलेले आढळून येते. या चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा घेतलेली दिसून येते. या मूर्तीच्या मस्तकावर कोरीव किरीटमुकुट घातलेला आहे. या मूर्तीच्या कमरेच्या वस्त्रावरील चुण्यादेखील अत्यंत बारकाईने दाखवलेल्या आहेत. ही मूर्ती अंदाजे इसवीसनाच्या पाचव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आली होती, असे अभ्यासकांचे मत आहे. या सुरुवातीच्या काळातील विष्णुमूर्तींखेरीज इतरही विष्णुमूर्ती इंडोनेशियामध्ये सापडतात. इंडोनेशियातील प्रंबानन येथील अकराशे वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या प्रसिद्ध मंदिरसमूहात एक विष्णुमंदिरदेखील आहे.

इंडोनेशियातील दीड हजार वर्षांपूर्वीच्या पूर्णवर्मन नावाच्या राजाच्या एका शिलालेखाशेजारी दोन पावले कोरलेली आहेत. ही पावले त्रिविक्रम विष्णूची असल्याचे तसेच पूर्णवर्मन राजा हा विष्णुसमान असल्याचे त्या शिलालेखातून नमूद केलेलं आहे. भूतलावरील पूर्णवर्मन राजा हा विष्णूचा अवतार आहे, हे सांगण्याचा प्रयत्न राजाने या शिलालेखातून केलेला आहे.

आग्नेय आशियातील मोजक्याच विष्णुमूर्तींबद्दल माहिती करून देण्याचा प्रयत्न या लेखातून केलेला आहे. परंतु आग्नेय आशियातील या विविध देशांमध्ये विष्णूच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. अगदी शैवपंथाइतका नसला तरी वैष्णवपंथाचा प्रभाव आग्नेय आशियातील या देशांमध्ये होता हे तेथील विष्णुमंदिरे, शिलालेख आणि मूर्तींवरून लक्षात येते.

(सदराचे लेखक सांस्कृतिक वारसा अभ्यासक आहेत.)

डायरेक्ट विष्णूची देवळेही कधी बघितलेली नाहीत पण विष्णूच्या अवतारांची कित्येक देवळे असतात.

म्हणजे वैष्णव हे मुर्तीपूजा न मानणारे किंवा अज्ञेयवादी असावे का? आणि त्याच मुळे शैव आणि वैष्णव असे वाद होत असतील?

माझी दोन्ही पंथांबद्दलची माहिती तोकडी आहे, पण असा विचार मनात आला.

पुरातत्व विचार करता प्रचेतस भाऊ डिटेल सांगतीलच पण एकंदरीत विष्णू मंदिर हे पहिल्यांदा गुप्तकाळात बांधलेले रेफरन्स वाचलेले आठवतात (संदर्भ व्ही डी महाजन, के कृष्ण रेड्डी) ह्या (गुप्तकालीन) मंदिरांचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे मंदिराच्या आवारात असलेला पवित्र गरुड स्तंभ हा होय.

जिथे भगवंत मंदिर असते तिथे मूर्ती विष्णू चेच असते. शेषशायी पद्मनाभ किंवा शंख चक्र गदाधारी किंवा अभयहस्त व्यंकटेश हा विष्णूचा अवतार नव्हे तर प्रत्यक्ष विष्णू आहे. आणि तशी मंदिरे आहेत.
प्रसिद्ध मंदिर तिरुपती.
अप्रसिद्ध मंदिर बार्शी

पुण्यातील विष्णू मंदिरे -

१) नवा विष्णू मंदिर - बाजीराव रस्त्यावर शनिपाराजवळ नातूबागेपाशी नवा विष्णू मंदीर आहे. सार्वजनिक काका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जोशी कुटुंबियांच्या मालकीचे हे मंदिर आहे.

२) बिजवर विष्णू मंदिर - शनिवार पेठेत वीर मारूतीशेजारी बापट कुटुंबियांच्या मालकीचे छोटे विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर १८३८ मध्ये स्थापन झाले.

३) कसबा गणपती मंदिराशेजारील केदारेश्वर बोळात पौरोहित्य करणाऱ्या कानडे कुटुंबियांचे खासगी विष्णू मंदिर आहे. हे मंदिर त्यांनी १९७४ मध्ये स्थापन केले.

४) शनिवार पेठेत रमणबाग चौकात माणकेश्वर विष्णू मंदिर आहे.

५) २९१, सोमवार पेठ येथे एक विष्णू मंदिर आहे.

६) लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग विष्णू मंदिर हे सुप्रसिद्ध मंदिर आहे.

७) पर्वती टेकडीवर एक विष्णू मंदिर आहे.

८) पु. लं. च्या काही लेखात पुण्यात बायकी विष्णू मंदिर आहे असा उल्लेख आहे. याचा संदर्भ सापडत नाही.

 

शैव वैष्णव ही काय भानगड आहे कुणी थोडक्यात सांगेल का? नेट वर फापटपसारा आहे.

थोडक्यात शैव हे शिवाला मानणारे तर वैष्णव हे विष्णूला मानणारे. पुढे शैव आणि वैष्णव पंथांपासून अनुक्रमे पाशुपत आणि पांचरात्र ही दोन भिन्न मतेही तयार झाली. प्राचीन काळी ह्या दोन पंथांमध्ये संघर्षही फार होत असावा पण कालांतराने दोन्ही पंथ काहीसे एक करण्याचा प्रयत्न झाला. रामायण महाभारता हे स्पष्टपणे दिसून होते. उदा. रामाने, कृष्णाने केलेली शिवस्तुती किंवा शंकराने गायलेले विष्णूचे गोडवे. हे प्रकार शैव वैष्णवांमधील कटुता दूर करण्याकरताच निर्माण केले गेले ह्यात शंका वाटण्याचे काही कारण नाही.

महाशिवरात्रीचा उपवास दरवर्षी करतो पण थेट विष्णुच्या नावे बहुतेक तरी कुठलिही पूजा वगैरे कुटूंबात झाल्याचे आठवत नाही.

सहसा अभिषेकाच्या वेळी विष्णूपूजा होत असते. सत्यनारायण पूजा ही विष्णूपूजाच आहे.

महाराष्ट्रीयन हे शैव असावे कि वैष्णव ???

दोन्हीही आहेत. मात्र शैव प्रभाव जास्त आहे. शिव हे तळागाळात पोहोचलेले दैवत आहे. कुठल्याहि गावात भैरवनाथ असतोच.

मला वाटते विष्णू सहस्रनाम सोडून थेट विष्णूच्या नावाने काही स्तोत्र/पूजा वगैरे नसतात. पण विष्णूच्या अवतारांच्या नावाने उत्सव वगैरे असतात (रामनवमी, जन्माष्टमी वगैरे). डायरेक्ट विष्णूची देवळेही कधी बघितलेली नाहीत पण विष्णूच्या अवतारांची कित्येक देवळे असतात.

विष्णूचे अवतार स्वरुपात उन्नयन झाल्याने विष्णूची देवळे कमी आहेत मात्र ती आहेत. कोकणात अधिक प्रमाणात दिसतात.

म्हणजे वैष्णव हे मुर्तीपूजा न मानणारे किंवा अज्ञेयवादी असावे का? आणि त्याच मुळे शैव आणि वैष्णव असे वाद होत असतील?

नाही, मूर्तीपूजा उलट वैष्णवांत जास्त प्रचलित आहे असेच म्हणता यावे. शिवाची पूजा ही मुख्यतः लिंगस्वरुपातच किंवा भैरव आदी ग्रामदेवता ह्या स्वरुपात होते.

मूर्तीपूजा न मानणे ही संकल्पना भारतीय परंपरेत बहुतेककरुन आढळत नाही

वेदकाळी महाभारतकाळी मूर्तीपूजा प्रचलित नव्हती, इंद्र, ब्रह्मा, स्कंद, रूद्र (अनार्य) ह्या वैदिक देवतांचे प्राबल्य होते. भारतात युधिष्ठिर, हरीवंशात श्रीकृष्ण ह्यांचा दिनक्रम विस्ताराने आलेला आहे, पण त्यात कुठेही मूर्तीपूजेचे वर्णन नाही, मात्र मूर्तीपूजा नव्हतीच असेही नाही, महाभारतात भीष्मपर्वाच्या आरंभी अपशकुनांचे वर्णन आलेले आहे ते असे. अर्थात हे वर्णन सौतीने इसवी सन पूर्व ३०० च्या दरम्यान घातले असावे.

देवताप्रतिमाश्चैव कम्पन्ति च हसन्ति च।
वमन्ति रुधिरं चास्यैः स्विद्यन्ति प्रपतन्ति च॥
देवांच्या प्रतिमा कंपायमान होतात, हसतात, रक्ताची उलटी करतात, स्वेद बाहेर टाकतात.

कैरातपर्वात अर्जुनाचा किराताच्या हातून पराभव झाल्यावर त्याने मातीपासून शिवलिंग स्थापन केल्याचेही वर्णन आहे.
मात्र असे असले तरी त्याकाळी मूर्तीपूजेचे प्रमाण नगण्य होते असेच दिसून येते. प्रजेमध्ये कदाचित असू शकेल.

असं वाटत नाही, निर्गुण निराकार भक्ती , मानसपूजा, अद्वैत उर्फ नॉन ड्युअलिजम ह्यांची वाढ अन इतिहास पाहता कोणे एकेकाळी अमूर्त भक्ती भारतीय परंपरेत बऱ्यापैकी रुळलेली संकल्पना असावी असे वाटते,

अमूर्त भक्ती वैदिक सूक्तांद्वारे होतच होती. मात्र बौद्ध धर्माच्या उदयानंतर मूर्तीपूजेचे प्रमाण वाढत गेले, अद्वैत मत सुरुवातीला नव्हतेच, ते शंकराचार्यांनी मांडले, त्याआधी द्वैतीच होते.




























https://scroll.in/magazine/1070440/why-is-surya-the-only-god-in-the-brahmanic-pantheon-to-wear-high-boots?utm_source=pocket-newtab-en-intl

Why is Surya the only god in the Brahmanic pantheon to wear high boots?

Kamayani Sharma

It was the boots that intrigued me.

Meandering through the Government Museum in Mathura in sandals befitting the hot summer afternoon, I was almost irrationally bothered by the sight of so much close-toed footwear on the sculptures of the Hindu sun god Surya.

In one bronze rendering, a nimbate Surya sits between two hierarchically-scaled little horses, a dagger between his booted feet, in another sandstone composition, he stands holding a lotus in each hand, flanked by his attendants, and in yet another stone tableau, he appears to rest on his haunches as he is chauffeured in a seven-steed chariot. Notwithstanding the range of his poses, whether in the early centuries of the Common Era or the tenth, Surya was always shod.

In the Brahmanic pantheon of the first millennium CE, Surya is the only deity who wears shoes. As art historian Pratapaditya Pal writes in the first volume of his Indian Sculpture: Circa 500 B.C.-A.D. 700 (1986), Surya is “...a regal figure like Vishnu but usually with two arms. The lotus is his distinctive emblem, which he holds with both hands. He is further distinguished only in northern India by his jacket or coat of mail, trousers and boots, generally the attire of the inhabitants of northwestern India and central Asia.”

Why would a subtropical solar deity be fitted with high boots suited for cold steppes rather than hot plains? And what meaning does the incongruous ensemble impart to the depiction of this specific god?

Getting a makeover

There was a time when Surya dressed for the weather.

Originating as a divine character in one of the earliest hymns of the Rg Veda, he seems to have made his full-fledged visual debut almost a thousand years later. In the essay Greek Helios or Indian Surya: The Spread of the Sun-God Imagery from India to Gandhara, historian and numismatist Osmund Bopearachchi points to Surya’s appearance on the railing of the Mahabodhi temple in Gaya in the 2nd century BCE and at the Bhaja Vihara caves in the 1st century BCE as being “among the earliest representation of Surya found in South Asia”. In these Sunga period incarnations, Surya rides a chariot flanked by his two wives, Usa and Pratyusa, vanquishing darkness in the former case with the support of his consorts’ archery and, in the latter, by trampling it (manifested as demons) underhoof. The human feet are not visible, shielded by the frontality of the composition and thus the chariot’s bow. But the accessories clue us into their likely status, as historian Marion Frenger decodes in her essay The Sun in Stone–Early Anthropomorphic Imagery of Surya in North India (2020).

A sculpture of Surya at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [CC BY 3.0].

Referring to the Bodh Gaya image as well as contemporaneous ones at Khandagiri (Odisha) and Lala Bhagat (Uttar Pradesh), Frenger observes that “all the insignia of an ancient Indian ruler including a large parasol above his head, an opulent turban, heavy ear-plugs and necklace…His upper body is bare, which is in keeping with the dress traditions of the subcontinent”. From this description, we can reasonably surmise that the sun god’s obscured choice of footwear was probably in keeping with the fashion trends of the 100s BCE (possibly similar to padukas or perhaps even barefoot).

So how or why did Surya undergo a makeover over the next few centuries?

One broad context for bundling up Surya involved the syncretism of his mythography. Commenting on the lack of inscriptions on representations before 500 CE, Frenger points out that “it is not even known if they were seen as images of Surya, as the Iranian sun god named Mithra/ Miiro, as the Greek Helios or – maybe the most probable supposition – as all three depending on the cultural background and contextual understanding of the individual viewer”.

Exemplifying this point is the fact that even in the earliest known iconography, it is not the Vedic rath of seven horses riding which the sun dawns, but the Hellenistic four-horsed quadriga. Frenger attributes this hybridity to the Buddhist nature of sites such as Bodh Gaya, since the Vedic articulation of the deity would have been far less important than accentuating his Buddha-like regality, an approach allowing inspiration from iconographic schemes of other solar gods, both proximate and distant.

A bronze statue of Surya from the Kushan period at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [GNU Free Documentation Licence].

It was the induction of Surya into the Buddhist religio-cultural sphere during this time that eventually led to his transformed aspect. In the book Images of Mithra, its five authors (Philippa Adrych, Robert Bracey, Dominic Daglish, Stefanie Lenk and Rachel Wood) note, “In the early first millennium, there were strong affinities between Miiro and Surya. Some texts include ‘Mitra’ as one of the names of Surya, and describe him as driving a seven-horse chariot. One text, the Bṛhatsamita Surya, prescribes that Surya should appear without multiplication of limbs and dressed in ‘northern’ garb…a decorated tunic and calf-high boots.”

Eclecticism of faith

The footwear that caught my eye in Mathura has finally surfaced in my research. By the 2nd century CE, Surya was taking his style cues from a certain northerly people – widely known as the Kushans.

Descendents of Yuezhi nomads from what is now the China-Mongolia border area of the Eurasian Steppe, the Kushan emperors ruled over one of the largest, wealthiest and most religiously diverse territories in the ancient world. Over a 500-year period straddling the turn of the 1st millennium CE, they governed from the present-day eastern borderlands of Iran to Patna. The most famous member of the dynasty, Kanishka I – whose statue was the purpose of my Mathura visit – is perhaps known best for his patronage of Buddhism. At the same time, he protected the practice of other belief systems in his realm, including the Vedic, Greek and Zoroastrian ones, during his 23-year reign sometime between 78 and 144 CE. This eclecticism of faith prevailing in the Kushan Empire became apparent too in the sacred art which flourished in it.

A headless statue of Emperor Kanishka at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [Creative Commons Attribution 3.0 Unported License].

In a 1999 paper titled Solar Iconography of Mathura, scholar Suresh Pandey inventoried the Surya figures held in that city’s Government Museum. Noting that ancient Mathura was the capital of the Kushan Empire, Pandey asserts that “the Iranian form of Sun-cult was given official recognition and the Sun-image with Iranian features like Udichya-vesha, Abhanga upanat-pinaddha, etc…The iconography of the Sun at Mathura during this period is of obvious Scythian influence and monastic boots as well as tailored coat with sleeves…”. While an indigenous version of the sun god continued to be privately worshipped, the Iranianised solar deity was the object of public worship supported by the Kushan state, an incarnation of the Central Asian culture itself.

By donning their attire, the summer Surya radiating unto the Doab had transformed into a representative of the Bactrian winter. But what was the reason for the sun god specifically to have become the locus of transfer of symbolic power?

The concept of solar kingship was old and ubiquitous in the realms of Asia and Europe, with monarchs up to the early modern period drawing on the metaphorical plenitude of the sun to emphasise their sovereignty. In his analysis of solar mythology from the Indo-Iranian world to the Greco-Roman one through the figure of Mithras, historian David H Sick interprets the sun god genre along the Silk Road as “the enforcer of contracts and the guardian of herds”. Surya’s own name, according to Sick, is etymologically linked to the Proto-Indo-European term for sun, allowing these layers of Eurasian meanings to settle upon him, like the mantle on Emperor Kanishka’s headless statue inaugurating Mathura museum’s main gallery. On closer inspection, the striations on his boots, suggestive of cold-proof padding, resemble the ones worn by a number of resident Suryas. Gesturing towards the similarities in costume and a deep squatting figuration denoting both king and god (different from Kanishka’s lifesize statue type), art historian John M Rosenfeld, in his definitive The Dynastic Art of the Kushans (1967), writes of the Kushans’ solar symbolism: “Some early images of Surya are so similar to Kushan royal portraits that it is possible to confuse one with the other.”

A statue of Surya at the Government Museum in Mathura. Credit: Biswarup Ganguly/Wikimedia Commons [GNU Free Documentation Licence].

Visual update

Whilst acknowledging the link between Surya and the Kushan royals, Rosenfeld did not think there was enough information to establish a direct investiture of political power from the former to the latter. Conversely, aligned with scholars like Sick, Frenger presents the homonymy of the Sanskrit word raj as both ‘to rule’ and ‘to shine’ as another possible explanation for why the sun god was an ideal surrogate for the king. Tracking the iconographic correspondences between the ruler and the light-giver from the Sunga period to the Kushan era, she sees the wardrobe change from bare torso to embroidered tunic as “reflect[ing]the contemporary apparel of the ruler”.

According to Frenger, this link is further corroborated by the detailed updating of visual elements into the representation of a pre-existing deity: “[T]his remarkable exactitude with which Surya images incorporated changes in the appearance of contemporary rulers was continued for several centuries. It shows that the relation between the sun god and the ruler was not the repetition of a once established iconographical convention but a ‘living’ feature. Artists and viewers alike obviously understood the reference to the ruler as an essential part of the sun image.” A later example supporting this correspondence is how in the era following the Kushans’ Hindu successors, the Guptas, Surya starts riding the seven-horsed Vedic rath.

As I make my way out of the Mathura museum, I stand before Emperor Kanishka’s massive statue, admiring his boots one last time. Through his glass case, I glimpse the smaller figures whose feet I have spent a whole afternoon scrutinising. On an absurd, anachronistic tangent, I am reminded of the famous Shawshank Redemption scene: “I mean, seriously, how often do you look at a man’s shoes?”

Clearly, as it turns out, far less often than a god’s.






सूर्य पूजा !! कुषाण कालीन "बूट" संस्कृति !!
सूर्य की उपासना भारत में वैदिक काल से ही महवपूर्ण रही है . कुषाण काल - शक क्षत्रप / गुप्तकाल के आसपास तो सूर्य मंदिर भी बनने लगे . ज़ाहिर है अब सूर्य की गणना प्रमुख देवताओं में होने लगी थी . शास्त्रीय पुस्तकों में ‘सूर्य’ के लक्षण बताये जाने लगे जिनके अनुसार ‘सूर्य प्रतिमा का निर्माण किया गया . सामान्यत: सूर्य प्रतिमा के निम्न अभिलाक्ष्ण होते हैं .
१. कंधे की ऊंचाई पर पर दोनों और खिले हुए कमल , एवं चेहरे के चारों ओर ‘कीर्ति मंडल’
२. अंधकार को दूर रखने के लिए धनुष बाण लिए बायीं ओर देवी प्रत्युषा ओर तथा दायीं ओर देवी उषा
३. बायीं ओर अश्वनी कुमार , दंड हाथ में लिए द्वारपाल ‘दंडी’ और देवी ‘निक्षुभा’
४. दायीं ओर अश्वनी कुमार , कलम और दवात हाथ में लिए द्वारपाल ‘पिंगल’ और देवी ‘रजनी’
५. पैरों में ‘बूट’ पहने हुए , संभवतः भारतीय देवताओं में ‘सूर्य’ को ही ‘बूट पहने’ दिखाया गया है.
६. सबसे नीचे ‘अधिष्ठान’ पर सात घोड़े , एक पहये का रथ , सारथि ‘आरुणी’ ...अथवा ‘महाश्वेता देवी’
७. कई बार अन्य देवताओं को भी साथ में दिखा दिया जाता है .
समय के साथ धीरे धीरे ‘सूर्य’ का महत्व कम होने लगा और ईसा की तेरहवीं सदी के आते आते ‘सूर्य’ का स्थान मात्र नवग्रहों में ही सुरक्षित रह सका ....
Courtesy : Sanjeev Singh
सूर्यपूजा गुजरात मे होती थीं । यहाँ काफी सूर्य मंदिर थे । जिसमें से आज भी बहोत सारे बचे हुए है । आश्चर्य की बात यह है कि कुछ में सूर्य भगवान की मूर्ति कि पूजा कुछ अलग देव के रूप में आज होती है । कंठकोट के सूर्य मंडूर की विशाल मूर्ति मंदिर के भूकंप में गिरने के बाद पुरातत्व विभाग या और कोई सरकारि लोग ले गए है, जबकि शामलाजी के सूर्य मंदिर की मूर्ति चोरी हो गयी है । रोड़ा और ओखा मंडल के मंदिर की सूर्य मूर्ति वडोदरा म्यूज़ियम में है । भवनाथ भीलोड़ा के सूर्य मंदिर के सूर्य की जगह विष्णु मूर्ति रखी है । महिसागर के डॉलरिया गांव में छोटा सा सूर्य मंदिर भग्न हालात में खड़ा है । प्रत्यक्ष देव होने के बावजूद सूर्य पूजा आजकल नही होती है ।
आभार :तरुण शुक्ल
शैयर जरूर करें वीरों !!
वीर गुर्जर इतिहास व संस्कृति :--
Veer Gurjar History N Culture
https://www.facebook.com/HistoryofGurjars?locale=hi_IN

भारत में सूर्य प्रतिमाओं का प्रचलन, मिथक और इतिहास 

----------------------------------------------------------------
सूर्य प्रतिमा, मथुरा संग्रहालय 

सूर्य प्रतिमा, मथुरा संग्रहालय (कुषाण काल)

रथ पर सवार सूर्य की प्रतिमा, मथुरा संग्रहालय

रथ पर सवार सूर्य परिवार, मथुरा संग्रहालय


प्रकाश आैर शक्ति का प्रतीक सूर्य विश्व की अनेक संस्कृतियों में आराध्य के रूप में पूजित होते रहे हैं। अपने देश या भारतीय उपमहाद्वीप की बात करें तो सूर्योपासना के मूल यूं तो वैदिक काल से ही मिलने लगते हैं, पर कुषाणों के समय से उसमें कई परिवर्तन हुए आैर गुप्तकाल से यह पद्धति ‘सौर संप्रदाय’ के नाम से जाने जानी लगी। इसे पंचदेवताओं में से एक माना जाने लगा। इन्हीं पंचदेवताओं के आधार पर पंचायतनों की कल्पना भी की गई, जिसमें मुख्य देवता बीच में स्थित होता है तथा अन्य चारों उसके चारों तरफ या आगे पीछे रहते हैं। ये पंचदेवता हैं शिव, शक्ति, विष्णु, गणपति आैर सूर्य। जहां तक सूर्य प्रतिमा या प्रतीक की बात आती है तो सर्वप्रथम इसे गोल चमकदार रूप में प्रतिकृत किया गया। देखा जाए तो यह प्राचीन प्रतीकों में से एक है या सर्वाधिक प्राचीनतम प्रतीक। शतपथ ब्रााह्मण के अनुसार सूर्य का प्रतिनिधित्व करने के लिए सुवर्ण का गोल टुकड़ा रखा जाना चाहिए। साम्ब उपपुराण में इसका वर्णन कुछ इस प्रकार है- पहले सूर्य की प्रतिमा नहीं थी, अपितु मण्डल में ही उसका पूजन होता था। जिस प्रकार आकाश में सूर्य-मण्डल विद्यमान रहता है, उसी प्रकार पहले भक्त लोग मण्डल का निर्माण कर लिया करते थे। इसके बाद जबसे विश्वकर्मा ने पुरूषाकृति सूर्य का निर्माण किया, तबसे घरों आैर मंदिरों में प्रतिमाओं की स्थापना होने लगी। भविष्य पुराण के अनुसार श्रीकृष्ण के पुत्र साम्ब के कुष्ठग्रस्त होने पर शाकद्वीप से अग्नि पूजकों के विरोध के कारण आये हुए मग ब्रााह्मणों ने सूर्य पूजा का विधान बताया था, जिसका अनुसरण करने पर साम्ब को कुष्ठ रोग से मुक्ति हुई थी। माना जाता है कि विश्वकर्मा जिनका दूसरा नाम त्वष्टा भी था ने अपनी पुत्री संज्ञा का ब्याह सूर्य से किया था। फिर संज्ञा के ही अनुरोध पर बेडौल आैर अत्यन्त प्रखर सूर्य को सुन्दर आैर सुडौल बनाया था। सूर्य उस पूरी प्रक्रिया में होने वाले कष्ट को सह ना सके, आैर सूर्य के अनुरोध पर विश्वकर्मा ने उनके घुटने से नीचे के भाग को अपूज्य घोषित करके छोड़ दिया। इस तरह कहा जाए तो भारतीय परंपरा में सूर्य पूजा की जो परंपरा प्रतीकों से शुरू होती है वह बाद के वर्षों में मानवीय स्वरूप ग्रहण कर लेती है। महाभारत में सूर्य पुत्र कर्ण की कथा से हर भारतीय किसी ना किसी रूप में परिचित ही है।


भारतीय कला में सूर्य की प्रतिमा शुंगकाल से मिलने लगती है। बौद्ध शिल्प में भी सूर्य का अंकन मिलता है। बोधगया के एक वेदिका स्तम्भ में चार घोड़ों द्वारा खींचे जा रहे रथ पर सवार सूर्य को दिखाया गया है। इस रथ पर कोई सारथी तो नहीं है लेकिन साथ में धनुष पर बाण चढाये ऊषा व प्रत्यूषा अवश्य हैं। दूसरा रथारूढ सूर्य उड़ीसा के अनन्त गुफा के द्वार पर मिलता है। लगभग इसी काल के भारतीय यूनानी राजाओं में प्लेटो आैर फिलोक्सीनास की मुद्राओं पर हेलिऑस या सूर्य अंकित दिखते हैं। यहां भी सूर्य चार घोड़ों के रथ पर सवार हैं। एक आैर समानता यह भी है कि इनमें से किसी में भी रथ के पहिए नहीं दिखाये गये हैं। दक्षिण भारत में भी इस काल में कुछ इसी तरह के सूर्य प्रतिमाओं का अंकन मिलता है। भाजा की गुफा में एक विशालकाय राक्षस को रौंदकर चलने वाले सूर्य रथ का अंकन किया गया है। इन सभी अंकनों में एक आैर साम्यता है कि सभी में सूर्य के पैरों का बड़ी ही कुशलता से छिपा दिया गया है। इतिहाकारों का मानना है कि कदाचित यूनानी हेलियस की देखादेखी भारतीय कलाकारों ने भी अपनी रुचि के अनुसार चार घोड़ों के रथवाले सूर्य को शुंगकाल में बनाना प्रारंभ कर दिया था। माना जाता है कि कुषाण काल आते आतेसूर्यप्रतिमाओं की संख्या बढ़ने लगी। मथुरा संग्रहालय में कुषाणकालीन आैर कुषाणोत्तर कालीन सूर्य प्रतिमाओं का एक बड़ा संग्रह है। कुषाणकाल की प्रारंभिक सूर्य मूर्तियों में सूर्य के दाहिने हाथ में कमल की कली है तथा बांयें हाथ में छुरी। इसी काल की दूसरी प्रकार की मूर्तियों में दोनों हाथों में कमल की अद्र्धविकसित कलियां हैै। गुप्तकाल में पहुंचते पहुंचते ये कमल पूर्ण विकसित हो जाते है आै बाद में सदैव के लिए सूर्य के स्थायी चिन्ह बन जाते हैं। तथा कुषाणकाल की छुरी तलवार में बदल जाती है आैर अब यह कमर में लटकने लगती है। इसे अग्निपुराण में खड़ग आैर कमलधारी सूर्य के रूप में बतलाया गया है।  

सूर्य प्रतिमाओं के संबंध में एक आैर विचारणीय तथ्य है सूर्य के पैर में जूतों का होना। उत्तर भारत की सूर्य प्रतिमाएं ईरानी वेष में मिलती हैं जिनके पैरों में ऊंचे जूते भी रहते हैं। जबकि पूजा में जूतों का उपयोग मान्य नहीं है बल्कि इसका पूर्णत: निषेध रहता है। किन्तु इसके विपरीत ईरानी वेशभूषा में जूतों का सम्माननीय स्थान था। बृह्तसंहिता के अनुसार सूर्य मूर्ति पैर से जंघा तक गुप्त रहनी चाहिए। विष्णुधर्मोत्तरपुराण के अनुसार सूर्य को रथ में बैठा दिखलाना चाहिए। वहीं मत्स्यपुराण का कथन है कि सूर्य के चरण तेज या प्रकाश से आवृत होने चाहिए। वहीं महाभारत की एक कथा के अनुसार संसार में जूतों का प्रचलन सूर्य देवता के द्वारा ही हुआ। उन्होंने ही सर्वप्रथम ऋषि जमदग्नि के श्राप से बचने के लिए उनकी पत्नी रेणुका को जूते आैर छतरी दी, जिनकी सहायता से ऋषि पत्नी प्रखर धूप से अपने को बचा सकी।

                                                                                           ---------सुमन कुमार सिंह ​


सन्दर्भ : विकिपीडिया 
  प्राचीन भारतीय मूर्तिविज्ञान : लेखक - नील पुरुषोत्तम जोशी 
https://singhh63.blogspot.com/2018/03/blog-post.html

ऐरण में गुप्तकालीन विष्णु मूर्ति, वराह की सबसे बड़ी मूर्ति, जानिए अद्भुत स्थल को


सागर: मध्य प्रदेश में सागर जिले के सबसे प्राचीन तहसील खुरई से 25 कि. मी. दूर प्रचीनतम और ऐतिहासिक ऐरण नामक स्थल स्थित हैं. बीना और वेतवा नदी के संगम पर स्थित ऐरण का नाम यहां अत्यधिक मात्रा में उगने वाली ‘एराका’ नामक घास के कारण रखा गया है.

कुछ लोगों का यह भी मानना है कि ऐरण के सिक्कों पर नाग का चित्र होता था जिसके कारण इस स्थान का नामकरण एराका अर्थात नाग से हुआ है जिसे ऐरण नाम से जाना जाता हैं. इस प्राचीनतम और ऐतिहासिक स्थल के इतिहास को जानने के लिए पुरातत्व सर्वेक्षण विभाग की टीम को खुदाई की मंजूरी मिल गई हैं.

प्रचीनतम स्थल ऐरण:

सागर जिले में ऐरण नामक स्थान पर गुप्त काल में विष्णु का एक मंदिर बना था, जिसमें भगवान विष्णु की 8 फुट ऊँची मूर्ति थी जो अब ध्वस्त हो चुका है. लेकिन आज भी वह मूर्ति ऐरण में स्थित है मंदिर के गर्भगृह का द्वार तथा उसके सामने खड़े दो स्तंभ आज अवशिष्ट हैं ऐरण से प्राप्त ध्वंस अवशेषों में गुप्तकाल के भगवान विष्णु का मंदिर तथा उसके दोनों तरफ वराह तथा नृसिंह का मंदिर प्रमुख है.

वराह की इतनी बड़ी प्रतिमा भारत में कहीं नहीं है. इसके मुख, पेट, पैर आदि समस्त अंगों में देव प्रतिमाएँ उत्कीर्ण की गई हैं. विष्णु मंदिर के सामने 43 फुट ऊँचा स्तम्भ आज भी खड़ा है जिस पर भगवान विष्णु के वाहन गरुड़ की 5 फुट ऊँची प्रतिमा उस स्तंभ पर विराजमान है। इन अवशेषों के समीप अनेकों अभिलेख भग्न शिलापट्टों के रूप में पड़े हैं.

ऐरण का इतिहास:

ऐरण गुप्तकाल में एक महत्त्वपूर्ण नगर था. यहाँ से गुप्तकाल के अनेक अभिलेख प्राप्त हुये है. गुप्त सम्राट समुद्रगुप्त के एक शिलालेख में ऐरण को ‘एरकिण’ कहा गया है। इस अभिलेख को कनिंघम ने खोजा था. यह वर्तमान में कोलकाता संग्रहालय में सुरक्षित है. यह भग्नावस्था में हैं. फिर भी जितना बचा है, उससे समुद्रगुप्त के बारे में काफ़ी जानकारी प्राप्त होती है। इसमें समुद्रगुप्त की वीरता, सम्पत्ति-भण्डार, पुत्र-पौत्रों सहित यात्राओं पर उसकी वीरता का वर्णन है.ऐरण से एक अन्य अभिलेख प्राप्त हुआ है, जो 510 ई. का है. इसे ‘भानुगुप्त

का अभिलेख’ कहते हैं. अनुमान है कि भानुगुप्त राजवंश से सम्बन्धित था. यह लेख महाराज भानुगुप्त के अमात्य गोपराज के विषय में हैं जो उस स्थान पर भानुगुप्त के साथ सम्भवतः किसी युद्ध में आया था और वीरगति को प्राप्त हुआ था. गोपराज की पत्नी यहाँ सती हो गई थी. इस अभिलेख को एरण का सती अभिलेख भी कहा जाता है.

ऐरण आज भी एक ऐतिहासिक और प्राचीनतम स्थल हैं जहाँ प्रचीनतम इतिहास की छवि झलकती हैं और यह प्राचीन स्थल इतिहास के बारे में जानकारी देता हैं.





No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...