Sunday, June 23, 2024

विदर्भातील मुर्ती

 तात्याटोपे आमच्या इथे पण आले होते
पत्रलेखिका
नटेश शिव- आठ हाताची तांडव नृत्य मूर्ती.
शुकसारिका
इंद्र पत्नी शचि
अंधकासूरवध अलिढासनातील मूर्ती .


इंद्र शचिसह



विदर्भाची काशी : मार्कंडेश्वर मंदिर, मार्कंडादेव, गडचिरोली

अकोला येथील महादेवाचे मंदिर दाखल्याबद्दल आपले धन्यवाद






 पंचकोनी शिवलिंग, मनसर, नागपूर 



भव्य शिवलिंग, बाबुपेठ, चंद्रपूर

त बोते 









विदर्भातील काही पुरातन कृष्ण मुर्ती :

चंद्रपूरमध्ये खोदकामावेळी श्रीकृष्णाची मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती आढळून आल्यानंतर नागरिकांनी तिची पूजा केली. ही प्राचीन मूर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे ही मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होतेय.
शौचालय बांधकामासाठी खड्डा खोदणं सुरू होतं. सात फूट खोल खड्डा खोदून झाला होता. अन् काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तो केवळ दगड नसून श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होतं. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. मूर्तीला दुग्धभिषेक करत हात जोडले. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांना ही मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी सांगितलं. श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
सौजन्य - महाराष्ट्र टाइम्स

हि कृष्ण मूर्ती पहूर ता.बाभुळगाव जि.यवतमाळ येथील आहे.बघा तत्कालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना.
मुख्य मूर्तीच्या चारही बाजूने लहान मूर्ती कोरल्या आहेत.
विष्णू मूर्ती आहे शंख चक्र आहे आणि ४ हात आहे

ट द्या !












कार्तिक स्वामी मंदिर, अचलपूर, अमरावती
अचलपूरच्या बिलानपुऱ्यात श्री कार्तिकेय स्वामींचे मंदिर आहे. त्या मंदिराची रचना ही जरी अर्वाचीन काळातील असली तरी तेथील मूर्ती मात्र यादवकालीन आहे. कार्तिकेयाची ती मूर्ती शिल्पकलेचा अद्भुत असा नमुना आहे. शिव-पार्वती पुत्र कार्तिकेयाचा जन्म स्कंदपुराणानुसार तारकासुराचा वध करण्यासाठी झाला. तो देवांचा सेनापती अनेक शस्त्रांनी सिद्ध असतो. मूर्तिशास्त्रानुसार कार्तिकेय मूर्ती सहा मुखे (म्हणून त्यास षडानन असेही म्हणतात) व बारा हात अशा स्वरूपात असते. कार्तिकेयाचे वाहन मयूर आहे. अचलपूरची कार्तिकेयाची मूर्तीदेखील सहा मुखांची असून, तिची दर्शनी तीनच मुखे व सहा भुजा दिसतात. कार्तिकेय मयूर वाहनावर आरूढ आहे. यानक अवस्थेतील ती मूर्ती चार ते साडेचार फूट आहे. प्रदक्षिणा क्रमाने उजवीकडील हातांमध्ये अक्षमाला, गदा, अंकुश तर डावीकडे पाश, कमंडलू, धनुष्य अशी शस्त्रे धारण केलेली आहेत. मूर्ती सालंकृत असून तिन्ही शीर्षांवर मुकुट आहेत. कानांत कुंडले, गळ्यात हार, दंडात केयूर, अंगद, कटी सूत्रे, स्कंधमाला, कटकवलय, पादवलय अशा सर्व अलंकारांनी अलंकृत आहे. मूर्तीच्या महिरपीवरसुद्धा कोरीव काम केलेले आहे. महिरपी वर वरील भागात शिवमूर्ती कोरलेली आहे. शिवमूर्तीच्या हातामध्ये बीजपूरक, त्रिशूळ असून ते वरदहस्त असे शिल्प आहे. कार्तिकेयाचे वाहन मोर हा सुद्धा शिल्पीने कोरीव कामाने देखणा केलेला आहे. अचलपूर नगरीत अशा बऱ्याच मूर्ती आहेत. काही भग्न स्वरूपात तर काही चांगल्या स्थितीत.
(माहिती - अनुपमा खवसे, थिंक-महाराष्ट्र)
(Photo - Pravin Tayde, Pramod Jawale, Mandir Kosh)

h)


पार्वती मंदिर, अचलपूर, अमरावती
अचलपूर येथील वतनदार देशपांडे यांच्या वाड्यात पार्वती देवीचे मंदिर आहे. तेथे पार्वती गौरी रूपात आहे. मंदिर देशपांडे यांची खाजगी मालमत्ता असली तरीही अचलपूर येथील स्थानिक भाविकांना देवीचे दर्शन घेता येते. मूर्ती शास्त्रानुसार देवीच्या शिल्पाला पार्वती गौरी असे म्हणतात. मूर्ती तीन-साडेतीन फूट असावी. ती कोरीव नक्षीकाम केलेली देखणी अशी आहे. गौरी रूपातील पार्वती चतुर्भुज आहे. ती प्रदक्षिणा क्रमाने स्थानक अवस्थेत समपाद चरणात उभी आहे. मूर्तीच्या दोन उजव्या हातांपैकी एका खालील हातात अक्षमाला आहे तर दुसऱ्या वरच्या हातात दांडी धरलेल्या गोल फलकात शिवपिंड आहे. डाव्या खालील हातात कमंडलू धरलेला आहे तर वरील हातात दांडीवरील गोल फलकात गणपती प्रतिमा आहे. पार्वती गौरीला जटा मुकुट आहे. ती संपूर्ण अलंकृत आहे. तिच्या गळ्यात फलक हार, एकावली, वैकक्षक माला तर दंडात अंगद, केयुर व मनगटावर बांगड्या आहेत. तसेच, कमरेवर मेखला, पायात पादवलय, नुपूर, जोडवी असे सर्व अलंकार सजलेले आहेत. कमनीय बांधा असलेली पार्वती त्यामुळे अधिकच खुलून दिसते. मूर्तीच्या पायाशी इतर दासीगण व नंदी कोरलेले आहेत. संपूर्ण शिल्पपटात महिरप कोरलेली आहे. त्यामुळे त्या मूर्तीची उत्कृष्ट व दुर्मीळ शिल्पाचा नमुना म्हणून गणना होते.
(माहिती आणि फोटो - अनुपमा खवसे, थिंक-महाराष्ट्र)





















































कालंका माता मंदिर, बार्शीटाकळी, अकोला
टंकावती नगरी बार्शीटाकळी. विदर्भातील प्राचीन शहरांपैकी एक असा बार्शीटाकळी शहराचा उल्लेख करावा लागेल. इसवी सन चौथ्या शतकातील सातवाहन काळापासून येथे मानवी वस्ती होती. त्या काळी या शहराला विशेष महत्व होते व येथे बाजारपेठ होती. संपूर्ण शहरात गल्लोगल्लीत प्राचीन काळातील बांधकामाचे अवशेष सापडतात. गावात एक किल्लाही होता. येथे भुयारांची श्रृंखलाच आहे. अनेक ठिकाणी भुयार आहेत. त्यामुळे याला भुयारी शहर म्हणूनही संबोधल्या जाते. शहरात भरपूर तळघरे आहेत. प्रत्येक गल्लीत दोन ते तीन तळघरं असल्याचे आजही दिसतात. बार्शी टाकळी येथे पूर्वी बारा वेशी होत्या व या गावाचे पूर्वीचे नाव टंकावती होते. टंकावतीचा अपभ्रंश होवून टाकळी असे झाले तर बारा वेशी असल्यामुळे बारशी. त्यामुळे गावाचे नाव बार्शी टाकळी पडले. या ठिकाणी पूर्वी सातवाहनांची एक शाखा होती. येथील कालंका देवीच्या मंदिरात असलेल्या शिलालेखात भिल्लम, टेकल्ली असा उल्लेख आहे. भिल्लम हा सातवाहनांचा एक राजा होता. येथे मुस्लीम, हिंदू, जैन धर्मियांचे मंदिरे व मशिदी आहेत. यावरून या ठिकाणी सर्वधर्मिय लोक नांदत होते, असे निदर्शनास येते.

ता।।


चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
भारतीय संस्कृतीत गणरायाचे सर्वोच्च स्थान आहे. आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप ज्ञात आहे. परंतु नेर तालुक्यातील ऐतिहासिक दुर्लक्षित जवळगाव येथे प्राचीन व दुर्मिळ गणेशाची चतुर्मुखी पुरातन मूर्ती आढळली आहे. विदर्भात अशा तीनच प्रतिमा असल्याने याला प्राचीन काळात विशेष महत्त्व असावे. म्हणून याबाबत पुरातत्त्व विभागाकडून संशोधनाची गरज आहे.
नेर तालुक्यात प्राचीन गणेशाचे स्थान असूनही ते उजेडात आलेच नाही. तालुक्याला मोठा सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा आहे. काही गोष्टी काळाच्या ओघात लुप्त होत असून, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. जवळगाव येथे आढळलेली प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण असून, ती यासाठी वेगळी आहे की, एकाच पाषाणात चार गणपती प्रतिमा अंकित केलेल्या आहेत. अशा प्रतिमेला प्रतिमाशास्त्रात 'सर्वतोभद्र' असे म्हणत असून, जवळगावची प्रतिमा याच प्रकाराची आहे. ती प्रतिमा उत्तमस्थितीत असून, पूर्वी उघड्यावर असलेली ही प्रतिमा ग्रामस्थांनी लहान मंदिरात स्थानापन्न केली आहे. काळ्या पाषाणात उत्कीर्ण केलेली ही प्रतिमा अंदाजे ७०० वर्षे प्राचीन आहे. चारही प्रतिमा चतुर्हस्त असून, अर्धपर्यकासनात बसलेली आहेत. हातात हस्तिदंत, परशु, अंकुश, मोदक धारण केलेले दाखविले आहे. या प्रतिमेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे चारही प्रतिमांच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेला भव्य व सुंदर मुकुट आहे. या मुकुटामुळे दुरून बघितल्यास ही गणेशाची सर्वतोभद्र प्रतिमा छोट्या मंदिराची प्रतिकृती वाटते.
गणपतीच्या इतर अलंकारात अतिशय ठळक दिसणारा अलंकार म्हणजे 'सर्प उदरबंध'. हाताला केयूर व बाजूबंध आहेत, अशी ही सर्वतोभद्र प्रकारातली प्रतिमा आहे. अशा प्रतिमा जेथे चार वाटा मिळतात, अशा ठिकाणी स्थापन केल्या जात असाव्यात, असे तज्ज्ञ सांगतात. म्हणजे वाटसरूंना चार दिशा दाखविण्यासाठीही अशा प्रतिमांचा प्राचीन काळात शुद्ध व्यावहारिक उपयोग होत असावा. याला पूरक असा संदर्भ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीत 'चतुष्पथीचे गणपती' म्हणून जो उल्लेख येतो, तो अशा प्रतिमांसंदर्भात असावा, असे सांगतात.
या मंदिराच्या बाजूला हेमाडपंथी शिवालय आहे. बाजूलाच पूर्वी श्री विष्णूचेही मंदिर होते. सोबतच गणपतीचेही मंदिर होते. परंतु, आता विष्णू व गणपतीच्या मंदिराचे केवळ अवशेष आहेत. परंतु, श्रीविष्णू व गणपतीच्या मूर्ती सुस्थितीत आहेत. गावाच्या पश्चिमेस आणखी एक हेमाडपंथी मंदिर असून, त्यात श्रीविष्णूची व गरुडाची मूर्ती स्थानांतरित केली आहे. दोन्ही हेमाडपंथी मंदिर गावचा ऐतिहासिक वारसा जपून आहे. गावात एक गढी असून, त्याचाही मोठा इतिहास आहे. गावात एक भवानी मातेचे अर्धपीठ असून, जेठसिंगच्या वंशजांनी ते तुळजापूरवरून आणल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव गुघाणे व ग्रामपंचायत सदस्य बाळू घोडे यांनी सांगितले. नेरमधील मानाच्या गणपती मठासोबतच आता या चौमुखी गणेशाची प्रतिमा मिळाल्याने याचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविक लोकप्रतिनिधींकडून व्यक्त करीत आहेत.

वी.
 




दशानन रावण मूर्ति, सांगोळा, अकोला
अकोला जिल्ह्य़ातील सांगोळ्यामध्ये रावणाची दहातोंडी मूर्ती आहे. या गावात दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या या मूर्तीची पूजा केली जाते. काय आहे ही अनोखी प्रथा?
विजयादशमी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय.. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय.. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस.. रावणाने सीतेचे अहंकारातून हरण केले याच अहंकारी रावणाचा दशमीला रामाने वध केला. म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला (दसऱ्याला) रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं..
रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. दृष्ट प्रवृत्ती असणारा अहंकारी माणूस.. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण विदर्भाच्या काही भागांमध्ये मात्र रावण पुजला जातो..
त्याबरोबरच सबंध भारतात एकमेव असावी अशी काळ्या पाषाणातील दशमुखी, वीस भुजाधारी, रावणाची मूर्तीदेखील येथे आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते.. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.
सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच काहीसं ओळखलं जातं.. गावात प्रवेश करण्यापूर्वीच गावात जाताना डाव्या बाजूने एका ओटय़ाच्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणाची एक भव्य मूर्ती दिसून येते. हीच ती रावणाची दशमुखी मूर्ती आणि याच मूर्तीभोवती सुमारे २० फुटांच्यावर चौरस दगडांनी बांधलेला ओटा आहे.. या मूर्तीसमोरील ओटा हेच गावातील रावणाचे मंदिर.. काळ्या दगडात घडवलेली ही मूर्ती रावणाचं अहंकारी रूप दर्शवते.
या मूर्तीला दहा तोंडे आहेत.. दहा तोंडाच्या दहाही चेहऱ्यांवरचे भाव हे अहंकारी, कपटी रावणाचेच दर्शन घडवतात.. दहा तोंडाच्या रावणाला चांदीचे डोळे लावलेले आहेत.. सर्व दहाही मस्तकांवर मुकुट आहेत. मूर्तीच्या हाती मोठी तलवार आहे शिवाय मूर्तीच्या इतर भुजांमध्ये इतर शस्त्रं आहेत (गदा, बाण.) ही मूर्ती युद्ध पेहरावात आहे. दसऱ्याच्या दिवशी सर्वजण रावणाविषयी राग, तिरस्कार द्वेष व्यक्त करतात. ठीकठिकाणी रावणाचा पुतळा जाळून रावणाचा निषेध केला जातो.
सांगोळ्यात मात्र जणू रावणाच्या या समस्त दुष्टपणाला, कपटीपणाला माफ करण्यात आले आहे.. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. रावणाची मूर्ती ही या गावात कशी आली याबाबत गावकरी आख्यायिका सांगतात. गावातील ग्रामदैवतेसमोरील झाडाची दगडी प्रतिकृती बनवण्याकरिता गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पंचक्रोशीतील बाभुळगावच्या एका शिल्पकाराला सांगण्यात आले.
त्या मूर्तीकाराने मूर्ती घडवली पण ती झाडाची न बनता दहा तोंडांची अहंकारी पुरुषाची प्रतिकृती निर्माण झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती मिळाली नसल्याने गावकरीदेखील विचारात पडले. पण मूर्ती तयार आहे तर न्यावी लागणार म्हणून मूर्ती न्यायचं ठरवलं आणि गावात गेल्यावर काय तो निर्णय घेऊ म्हणून निघाले असता प्रत्येक गावाची हद्द आली का मूर्ती असलेली बलगाडी अडून राहायची. हलायचीच नाही.
शेवटी गावकऱ्यांनी प्रत्येक गावाच्या वेशीवर नारळ फोडून गावात मूर्तीची स्थापना करू असे कबूल केले असता पुढे अडथळे आले नाहीत. अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा रीतीने मूर्ती गावात आली. सांगोळ्यातील रावण मूर्तीची अशी आख्यायिका आहे. दहा तोंडांची, अहंकारी भाव दर्शवणारी युद्ध पोशाखातील शस्त्राधारी मूर्ती असल्याने गावकऱ्यांनी रावणाची मूर्ती म्हणून या मूर्तीवर शिक्कामोर्तब केले. सहिष्णुता हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्यामुळे रावण जरी दुष्ट, कपटी, अहंकारी असला तरी सांगोळ्यात या रावणाची प्रतिष्ठापना केलेली आहे. गावात रावणाच्या मंदिराव्यतिरिक्त एक हनुमानाचे मंदिर आहे.. दसऱ्याला संध्याकाळी रावणाची विशेष पूजा गावकऱ्यांद्वारे केली जाते.. दसऱ्याच्या सणाला रावणाच्या मूर्तीला हार, फुलं वाहली जातात. मूर्तीसमोर दिवे पेटवले जातात. या गावातील रहिवासी व निवृत्त शिक्षक दिनकर पोरे याविषयी सांगतात की, दसऱ्याला ठिकठिकाणी रावणाचे पुतळे जाळून निषेध व्यक्त केला जातो. पण या निषेधात उन्मादच जास्त दिसतो..
रावण जरी दुष्ट प्रवृत्तीचा असला तरी तो एक प्रचंड ज्ञानी पंडित होता असं म्हटलं जातं, हे आपण सोयीस्कर विसरतो.. रावणाने साक्षात शंकरांना प्रसन्न करत अजेय वरदाने मिळवली होती, असं मानलं जातं. सांगोळ्यात या मूर्तीविषयी किंवा रावणाविषयी तिटकारा, तिरस्कार वाटत नाही.. की कधी विरोध म्हणून कुणीच रावणाच्या मूर्तीची टिंगल किंवा विटंबनादेखील केली नाही. इतर ठिकाणी मात्र रावणाची दसऱ्याला टिंगल व चेष्टा होतानाच जास्त दिसते.
गावात रावणाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कुठलाही मोठा उत्सव होत नसला तरी गावातील नागरिक आपापल्या सोयीनुसार पूजा करतात.. सांगोळा या गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात; किंबहुना सातपुडय़ाच्या पायथ्याचा भाग हा अतिदुर्गम तथा डोंगराळ, घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. याच पर्वतरांगांमध्ये मेळघाट वसलेलं आहे.
कोरकू हे रावणाला देव मानतात. कोरकू आदिवासींमध्ये असे मानले जाते की, महादेव त्यांचे पिता आहेत, शिवाय त्यांच्या उत्पत्तीसाठी रावणाने भगवान शिवाजवळ प्रार्थना केली आणी रावणाच्या भक्तिभावाने प्रसन्न होत महादेवाने कोरकूंची सृष्टी निर्माण केली. यासाठीच कोरकू हे दसरा तथा होळीला रावणाची पूजा करतात.
आदिवासी कोरकू फक्त रावणालाच नव्हे तर त्याचा पुत्र इंद्रजीत मेघनाद यालासुद्धा मनोभावे पूजतात. आदिवासी कोरकूंची अशी धारणा आहे की एकदा मेघनादने युद्धात कोरकूंचे रक्षण केले होते. यासाठीच कोरकू हे मेघनादपूजक म्हणूनपण ओळखले जातात. आदिवासी कोरकूंच्या गावात पूजेसाठी भलेमोठे दोन लाकडी उंच खांब रोवलेले असतात. मेघनाद खांब म्हणूनच ते ओळखले जातात.
पोस्ट - संतोष विनके

 

श्री भगवान नृसिंह जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !! 💐
स्थळ - मेहकर, बुलढाणा
नृसिंह मुर्ती, मेहकर, बुलढाणा

जगामध्ये पौराणिक ११ नृसिंह आहेत. त्यापैकी ६ वे नृसिंह मंदिर मेहकर (जि. बुलडाणा) येथे आहे. गीतेच्या अकराव्या अध्यायाच्या महात्म्यात या मेहकरच्या नृसिंहाचा उल्लेख आहे, एवढे हे स्थान प्राचीन आहे. म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे.

विष्णूच्या दशावतारापैकी ज्या अवताराची पूजा होते, असा नृसिंह हा पहिला अवतार आहे. मेहकरची ही नृसिंहमूर्ती खूप सुबक आणि रेखीव आहे.

पाकिस्तानातील मुलतान येथे अवतार घेतल्यानंतर भगवान नरसिंहाने मेहकर येथे भक्त प्रल्हादाने दिलेले भोजन ग्रहण केले होते, अशी आख्यायिका आहे. अयोध्येहून लंकेकडे जाताना प्रभू रामचंद्रांनी मेहकरचा राजा मेघंकर याला नृसिंहरूपात दर्शन दिले होते आणि कायम वास्तव्य करण्याचे अभिवचन दिले होते, असाही संदर्भ आहे. या मंदिरात विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राच्या पठणाचे विशेष महत्त्व आहे.

ही स्वयंभू श्रीमूर्ती अनेक शतके जमिनीखालील हेमाडपंती भुयारात बंदिस्त होती. (ते हेमाडपंती भुयार अद्यापही शाबूत आहे.) इ.स. १५६९ साली नागपूरचे नृसिंहभक्त श्री. श्यामराज पितळे यांनी ही श्रीमूर्ती त्या भुयारातून बाहेर काढून सध्याच्या मंदिरात प्रतिष्ठापित केली. तेव्हापासून साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला साडेचारशे वर्षांची परंपरा आहे.

नृसिंह मेहकर (दृष्टांत)
चौदाव्या शतकाच्या ऊत्तरार्धात नागपूर येथे श्री शामराज पितळे हे महान नृसिंह ऊपासक राहत होते. ऊपासना करत असताना ऐका रात्री त्यांना स्वप्न पडले व स्वप्नात नृसिंहाने दर्शन देऊन सांगितले की "नागपूर पासून 125 कोस पश्चिमेकडे महंकावती प्राचीन नगरी आहे. या नगरीच्या ऊत्तरेस व पैनगंगैच्या पुर्वेस एक पडका वाडा असेल त्या वाड्यात एक पीपळांचा विशाल वृक्ष आहे. त्याच्या ऊत्तरेस तुळशी जवळ खोदावे म्हणजे भुयार सापडेल या भुयारात माझी विशालकाय पाषाणाची मुर्ती बंदिस्त करून ठेवण्यात आली आहे. मला मोकळे कर व तेथेच माझी ऊपासना कर".
1569 मध्ये स्वप्न दृष्टांत नुसार आज्ञा मानून ते मेहकर आले. त्याना सर्व खुणा आढळल्या. भुयारात प्रवेश करताच ते आश्चर्य चकित झाले त्याना तेथे भगवान प्रल्हाद वरद श्री लक्ष्मी नृसिंहाची साडेचार फुटाची ऊंच व तीन फूट रुंद अश्या भव्य मुर्ती चे दर्शन झाले. बाजुला नंदादीप तेवत होता व नुकतीच कोणी तरी पुजा केलेली दिसत होती. भुयार बाराफुट खोल होते. (दृष्टांत माहिती - वर्षा मिश्रा)

भुयारातल्या श्रीमूर्तीला प्रतिष्ठापित केल्यानंतर श्यामराज पितळे मेहकरलाच राहिले. पुढे तीनशे वर्षांनी त्यांच्या घराण्यात साक्षात्कारी संत बाळाभाऊ महाराज पितळे उर्फ श्वासानंद माऊली यांचा अवतार झाला. त्यांचे जीवनचरित्र अद्भुतरम्य आहे.

सध्या त्यांचे चौथे उत्तराधिकारी विद्यमान गुरुपीठाधीश ॲड. रंगनाथ महाराज पितळे आहेत. त्यांच्या आदेशानुसार संस्थानचे वर्षभर सतत धार्मिक व सामाजिक उपक्रम सुरू असतात. श्रावण महिन्यात एक आठवडाभर विष्णुसहस्त्रनाम स्तोत्राचे रात्रंदिवस अखंड पाठ होतात. रात्रभर पुरुष आणि दिवसभर महिला एकही मिनिटाचा खंड न पडू देता या मंदिरात हे पाठ करतात. हा आध्यात्मिक क्षेत्रातला एक विक्रम आहे. विक्रमांची नोंद घेणाऱ्या संस्थेने या विक्रमाची नोंद घेतलेली आहे.

नृसिंह नवरात्रोत्सवामध्ये श्रीमूर्तीला दररोज वार देवतेच्या पोषाखाने सजविले जाते. या पोशाखाचे दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडते. यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे नवरात्रोत्सवातले जाहीर व प्रकट कार्यक्रम स्थगित केले आहेत. मात्र सर्व परंपरागत विधी यथाशास्त्र होणार आहेत.

जगातील ११ पैकी ६ वे नृसिंह मंदिर असल्याने दूरवरून लोक मेहकरला दर्शनाला येत असतात. आणि सोबतच जवळच असलेल्या लोणार सरोवरालाही भेट देतात.

(माहिती - गोपाल पितळे)







 केवल नृसिंह, रामटेक, नागपूर

नरसिंहाचे आपण अनेक प्रकारची शिल्पे पाहिली असतील..
पण केवल नृसिंह हे त्यातील एक दुर्मिळ शिल्प..

नागपुर पासून जवळपास 40-50 किमी अंतरावर असणाऱ्या आणि भोसल्यांच्या स्थापत्यकलेने नटलेल्या 'रामटेक' शहरातील एक पुरातन मंदिर..
80 च्या दशकपर्यंत एक फार मोठे शिल्प स्थानिकांकडून पूजले जायचे.
लोकांच्या-भक्तांच्या मते ते एका मारुतीचे शिल्प होते.

पुण्यातील ज्येष्ठ इतिहास व पुरातत्व अभ्यासक जामखेडकर सर हे या हनुमानाच्या मंदिरात एका सर्वेक्षणासाठी आले होते.मंदिरातील साऱ्या भिंतीवर चुनखडीचा मोठा लेप देण्यात आलेला होता,ज्यामुळे मंदिरातील स्थापत्यशिल्प आणि कलेवर त्याचे दुष्परिणाम झाले असते,म्हणून ते साफ़ करुन त्याचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले,आणि ह्याच कामात अचानक हाती आला एक मोठा ठेवा..

इसवी सन तिसऱ्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या विदर्भ आणि थोड्याफर प्रमाणात मध्य महाराष्ट्रात एक शक्तिशाली साम्राज्य उदयास आले.दोन शाखांमधे विभागल्या गेलेले 'वाकाटक' घराणे म्हणजे एक प्रतिष्ठीत घराणे..
ह्याच घराण्यातील 'वत्सगुल्म' शाखेच्या राजांनी अजिंठा लेणीमधे आपल्या कलेची छाप उमटवली.आणि दुसऱ्या 'नंदिवर्धन' शाखेने विदर्भात अभुतपूर्व राज्यक्रांति केली.

गुप्त घराण्याशी वैवाहिक संबंध जोडून आपल्या साम्राज्याची सीमा वाढवणाऱ्या या शाखेची सून म्हणजे "प्रभावतीगुप्त"..!!
आणि तीच्या कारकिर्दीमधे हे मंदिर बांधण्यात आल्याचे उलेख मंदिरातील शिलालेखात आढळून आले.

मंदिर संवर्धन करत असताना अचानक हाती आलेल्या ह्या शीलालेखामुळे इतिहास बदलला.
वाकाटक साम्राज्याने मंदिर बांधल्याचा पहिला पुरावा हाती आला.पुरातत्वाची मदत घेऊन इतिहासचे नवे पैलू उलगडल्या गेले.

आतल्या मुर्तीवर चढवलेला शेंदुराचा थर काढण्यात आला,आणि समोर आले हे अतिविशाल शिल्प..
हे शिल्प मारुतीचे नसून,नृसिंहाचे होते.जवळ जवळ 6 फुट उंचीच्या ह्या शिल्पात असणारी अखंड नृसिंहाची मूर्ती निव्वळ अद्भुत आहे.हातात चक्र असल्याने ह्या मूर्तिला 'चक्रपाणी' ह्याही नावाने ओळखतात.

लक्ष्मीशिवाय असणाऱ्या ह्या शिल्पाचा उल्लेख 'केवल नृसिंह' असा केला जातो.
आज ही जागा पुरात्तव खात्याच्या अखत्यारित्या आहे आणि त्याचमुळे ही मूर्ती,मंदिरातील शिलालेख सुस्थितीत आहेत.
पण लोकांची ह्या मारुतीवर श्रद्धा एवढी,की अगदी हुबेहुब ह्या शिल्पासारखे छोटे शिल्प तयार करुण आणून,मंदिराच्या समोरच छोट्या मंदिरात स्थापन करुण त्याला शेंदुर लावला आणि त्याची अजूनही मारुती म्हणूनच पूजा केली जाते..!!

ह्याच मंदिरापासून थोड्या दुरवर अजून एक नृसिंहाचे मंदिर आहे.त्यातील शिल्पही तेच,मंदिर बांधनीही तीच आणि नृसिंहही एकटा..पण ह्याचे नाव 'रूद्रनृसिंह'
प्रभावतीगुप्त हिने तीच्या पतिच्या,रुद्रसेना याच्या स्मृतीमधे हे मंदिर बांधले होते.

5 व्या शतकापर्यंत मध्य भारतावर जवळ जवळ 250 वर्षे राज्य केलेल्या ह्या साम्राज्याचे स्थापत्यकलेतील योगदान उलगडले आणि समोर आला एक वैभवशाली इतिहास..!!

- केतन पुरी

मोवाड, ता. नरखेड, जिल्हा नागपूर येथे वरंधा नदीच्या तीरावर फार पुरातन नृसिंह मंदिर आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वणी येथे पण पुरातन नृसिंह मंदिर आहे,

नृसिंह मंदिर, पुसद, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद हे तालुक्याचे ठिकाण. या गावातील अटकेश्वर वोर्डात हे नृसिंह मंदिर आहे. हि पुसदची जुनी वस्ती आहे. ह्या मूर्ती व मंदिराविषयी दंतकथा लोक मानसात रुजली आहे. असे सांगतात कि, कशीच्या एका ब्राह्मणाला साक्ष्त्कार झाला व त्याने गावातील १. उकिरडा बाजूस करावयास सांगितला. त्या खाली एक मोठी उभी शिळा दिसली. ती शीळा बाजूला केल्यावर मूर्ती नजरेस पडली. हि मूर्ती जेथे सापडली तेथेच चौथरा बांधून मंदिर बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नागारखाना आहे. येथून आत गेले ६ पायर्या चढून सभामंडप लागतो. चुन्यात बांधलेला हा मंडप प्रशस्त असून छत उंच आहे. समोरच्या भिंतीला असलेल्या लहान झरोक्यातून गाभार्यातील नरसिंहाच्या उजव्या पायाचे व पितळी पादुकांचे दर्शन घडते. ५ पायर्या उतरून गेल्यावर गाभारा नजरेस पडतो. मूर्ती प्राचीन आहे. काहींच्या मते २००० वर्ष पूर्वीची तर काहींची ५०० वर्ष जुनी असा मत आहे. मूर्ती यवनांच्या भीतीपोटी लपवली असा अंदाज आहे. नरसिंह मूर्ती काळ्या पाषाणाची असून मूर्तीवर वज्रलेप केला आहे. मूर्ती द्विभुज असून ४ फुटाची आहे. एका हातात चक्र तर दुसरा हात मांडीवर ठेवला आहे. हातात बाजूबंद असून यज्ञोपवीत परिधान केले आहे. नार्सिन्हाचा चेहरा सौम्य असून नजर थोडी झुकलेली आहे. जटामुकुट परिधान केला असून बाजूला प्रल्हाद व लक्ष्मीच्या अंजनी मुद्रेतील मूर्ती आहे. मूर्तीच्या मागे प्रभावळ असून पाठीमागे विष्णूची चतुर्भुज मूर्ती भिंतीत बसवली आहे. विष्णूच्या बाजूला मध्यभागी सरस्वती व डाव्या बाजूला कालियामर्दन कृष्णाची मूर्ती आहे.
नृसिंह जयंती ९ दिवस साजरी केली जाते. भंडारा होतो व साधारण १०००० लोक त्याचा लाभ घेतात

नरसिंह मंदिर, अंजी, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात असलेले अंजी हे गाव. येथे 12 व्या शतकातील प्राचीन भगवान नरसिंहाच मंदिर आहे. मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कोरीव स्तंभावर सभामंडप आहे त्यानंतर गाभार्यात नृसिंहाची मुर्ती आहे. मुर्ती च्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहे असून मांडीवर हिरण्यकशपू आहे. मुर्ती खूप पुरातन असून अंदाजे 1000 वर्षे जूनी असावी. चंद्रहास नावाच्या राजाने ही मुर्ती स्थापन केली अशी आख्यायिका गावकरी सांगतात.
महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्रपदेश व कर्नाटक राज्यातून येथे भाविक येत असतात. धनत्रयोदिशीच्या दिवशी येथे किरणोत्सव सोहळा साजरा केला जातो. वैशाख पौर्णिमेला नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते

नृसिंह मंदिर, जानोरी, बुलढाणा

जानोरी येथे नृसिंह मंदीर खूप प्राचीन आहे. येथील मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती खूप प्राचीन आहे, या मूर्तीच्या चेहऱ्यावरील हाव भाव भारतातील कुठल्याच नृसिहं मूर्तीला नाहीत, नृसिंहाची प्रत्येक मूर्ती हि आक्राळ विक्राळ भाव असलेली आढळते, परंतु जानोरी येथील मूर्तीची मुद्रा शांत स्वरूपाची आहे, तशी मुद्रा भारतात कुठेच नाही, आपण जानोरी येथील प्राचीन नृसिंह मंदिराला भेट देऊन अनुभव घेऊ शकता.

नृसिंह मंदिर, देऊरवाडा, अमरावती

निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थँक्यू’ म्हणण्याचा विधी "आठवीची पूजा"
निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याच्या प्रती आपणही कृतज्ञता अनेकदा व्यक्त केली पाहिजे. आणि करतोही त्यातूनच अनेक कृतज्ञतेचे सोहळे आलेत. त्याचेच पुढे सण झालेत. आठवीची पूजा म्हणतात, तोही त्यातलाच प्रकार. निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थॅंक्यू’ म्हणण्याचाच जणू हा विधी आहे. अष्टमीला केली जाणारी पूजा म्हणजे आठवी, आज ही पूजा अनेक ठिकाणी साजरी झाली. त्यासाठी बाजारातही संबंधित पूजासाहित्याची खरेदी दिवसभर चालली.
दसरा आणि दिवाळीच्या मध्ये ही पूजा होते. त्यामागे अनेक लोककथा, दंतकथा आहेत. भारतात शेती संपन्न आहे. या शेतीसंस्कृतीतून अनेक सण आलेत. आठवीची पूजा ही देवीची पूजा मानली जाते. काहीजण ही लक्ष्मीही मानतात. अश्विन महिन्यातील कृष्ण अष्टमीला ही पूजा होते.














रुद्रेश्वर मंदिर, पोहणा, हिंगणघाट, वर्धा

हे.



श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !!

त.
 





शारंगधर बालाजी, मेहकर, बुलढाणा
तिरुपतीमधील श्री बालाजीच्या मूर्तीपेक्षाही सुंदर अन् विलोभनीय अशी जगातील सर्वात उंच शारंगधर बालाजीची मूर्ती विदर्भातील मेहकर गावात विराजमान आहे. ११.२ फूट उंच फूट रुंद अन् अडीच फूट जाडी असलेल्या मूर्तीचे सौंदर्य तिच्या भव्यतेमुळे अधिकच खुलून दिसते. या मूर्तीचा इतिहासही रंजक आहे. पुरातन काळातील ही मूर्ती अठराव्या शतकात गावकऱ्यांना खोदकाम सुरू असताना सापडली. इंग्रज अधिका-यांनी मूर्तीसह शिलालेख अन् दागिने ताब्यात घेतले. ही मूर्ती लंडनच्या संग्रहालयात हलवली जाणार होती, पण गावकऱ्यांनी प्राणांची बाजी लावत तिची रातोरात प्राणप्रतिष्ठा करून टाकली. संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी शिलालेख दागिने लंडनला नेले, पण मूर्ती मात्र ते नेऊ शकले नाहीत. तेव्हा इंग्रजांनी मेहकरच्या ६० गावकऱ्यांना महिने तुरुंगात डांबले होते. यात जानकीराम अप्पा पाठक, रामभाऊ भिते पाटील, अॅड. मा. ल. देशमुख, निंभा गोंधळी, रामा कुणबी, विठ्ठल माळी आदींचा समावेश होता.
औरंगाबादपासून १२५ किमी अंतरावर विदर्भात मेहकर हे गाव आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर हे गाव असूनही जगाला या अद्भुत मूर्तीसह मंदिराची माहितीच नाही. पैनगंगा नदीकाठी जुन्या लाकडी, परंतु अत्यंत रेखीव वाड्यात हे मंदिर आहे. मोठ्या काळ्या पाषाणावर ही मूर्ती कोरलेली असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. त्यावर विष्णूंचे १० अवतार चितारले आहेत. मूर्ती मध्ययुगीन आहे.
मूर्तीचा शोध लागण्यापूर्वी हे गाव नृसिंहाचे स्थान म्हणून ओळखले जात होते. येथे लक्ष्मीनृसिंहाचे प्राचीन मंदिर आहे. ही मूर्तीदेखील एका भुयारात होती. १५ व्या शतकात ती गावकऱ्यांनी गावात आणली. त्यानंतर ३१९ वर्षांनी गावात शारंगधर बालाजीची मूर्ती सापडली.
इ.स. १८८८ मध्ये पोलिस पाटील रामभाऊ भिते यांच्या गढीत खोदकाम करताना २० फूट लांब फूट रुंद लोखंडी पेटीत ही मूर्ती होती. मूर्तीवर चंदनाचा भुसा होता. सोबत दोन ताम्रपट होते. त्यावर मूर्तीचा इतिहास लिहिलेला होता. तो दिवस होता नागदीपावलीचा. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, गोरज मुहूर्तावर डिसेंबर १८८८ ला मूर्ती सापडल्याने तोच दिवस गेल्या सव्वाशे वर्षांपासून प्रकटदिन म्हणून साजरा केला जातो.
🔸असा आहे शारंगधर बालाजी🔸
✔️ रेखीव मूर्ती, छाती पोट गोमुखाकृती.
✔️ मूर्ती चतुर्भुज असून हातात गदा, चक्र, पद्म आहे.
✔️ पायाजवळ जय-विजय, लक्ष्मी-कुबेर भूदेवी.
✔ ️हातातील शस्त्रांत धनुष्य नाही, पण मूर्ती भोवती प्रभावळीत विष्णूंचे दहा अवतार कोरले आहेत.
✔️ डोक्यावर शारंग नावाची धनुष्य धारण केलेली विष्णूंची मूर्ती कोरली आहे. म्हणून हा शारंगधर.
✔️ ही मूर्ती आशिया खंडातील सर्वात मोठी श्री बालाजीची मूर्ती आहे. तसा उल्लेख बुलडाणा जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये आहे. तीर्थक्षेत्रांच्या यादीत या मंदिराचे नाव असले तरी याला अद्याप हवी तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही.
जालन्यापासून वाशीम कडे जाणाऱ्या रस्त्यावर मेहकर आहे। ... आता समृद्धी महामार्ग पण मेहकर जवळुन जाणार आहे। मुकुटाच्या मध्यभागी धनुर्धारी श्रीराम मूर्ती आहे.. शारंगधर म्हणून नाव आहे। ही विशेष माहिती दिलेय श्री Uday Akolkar यांनी।

ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की दर्शनाच्या वेळी आपली मनस्थिती जशी असेल तेच भाव मूर्ती चे मुखावर दिसतात... अनुभव आलेले सांगतात.

इथे खाली पण एक जुने देखीव मंदिर तशीच एक ऐतिहासीक वास्तू आहे... ते पण फोटो आणि माहिती टाकायची असती सर














No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...