http://unadbhatkantee.blogspot.com/2016/05/blog-post.html
मन नेईल तिकडे स्वैर हिंडावं
सुखावलेल्या वाटांवरती उनाड फिराव.
तंगड तोड थकव्याने निवांत फिराव
कधी तापेलेल्या नारायणा पासून आडोसा धरावा
कधी भक्तीच्या चिंतनात ध्यानस्थ बसावं
तर कधी टाळ नादाच्या घोषात धुंद रामाव
कधी गुहेच्या शोधात आरपार घुसावं
अनपेक्षित समोर येणाऱ्या प्राण्या-पक्ष्याना पुसावं
मन नेईल तिकडे स्वैर हिंडावं
सुखावलेल्या वाटांवरती उनाड फिराव.
आजचा दिवस तसा खासच होता. खास ह्या कारणाने की अखेर कुठे ना कुठेतरी उनाडक्या
करण्यास बाहेर पडलो होतो. ह्या वीकेंड साठी दोन plan बनवले. अर्थात दोन्ही फसलेले. काहीच नाही म्हणून बरेच दिवस मनात असलेले देवदर्शन तरी
करून घ्यावे म्हणून सकाळी पाचचा अलार्म लावून साडेपाचला फटफटीला किक मारली. सोबतीला
हक्काचे उनाड होतेच. गण्या (गणेश) प्रथमेश आणि शिवाजी. फटफटीला पाणी पाजून गाडी
सिद्धटेक कडे सोलापूर हायवेने चांगलीच दमटवली. आजचे नियोजन सिद्धटेकचे
सिद्धिविनायक मंदिर जे अष्टविनायक पैकी दुसरा आहे त्याच दर्शन. दुसरे मंदिरापासून
१६ किमी वर असलेले धर्मवीरगड/पेडगावचा किल्ला पाहणे.
पाटस गावाच्या फाट्याजवळ भटक्यांचे पेटंट असलेली मिसळ हाणली आणि डाव्या हाताने वळसा घेत सिद्धटेक च्या दिशेने
जावा अश्या सांगणाऱ्या फलकाची आज्ञा मानुन भीमा नदीच्या खडखडीत सुखलेल्या पात्रावरचा
पूल ओलांडून सिद्धटेक मंदिर गाठले.
गाडी पार्क करून उतरत नाही तोपर्यंत एक मुलगा दुर्वा आणि फुलांचा हार घेवून
पुढ्यात उभा. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय?..... दुर्वांची जुडी घेवून,
रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी दुकानांची असलेल्या रांगेतून थेट मंदिर गाठले. सकाळी
लवकर हजर झाल्यानी फारशी गर्दी नव्हतीच. दुकानदारांची मात्र आवरा आवर करण्याची घाई
चालू होती. गुरव काका पण निवांत होते.

गाभाऱ्यात प्रवेश करण्याआधी दोन द्वारपालांनी दर्शन दिले. मंदिराचे कोरीव काम विशेष नजरेत भरले. उजव्या सोंडेचा गणपतीचे मनोभावे निवांत दर्शन घेतले. आणि सभामंडपात येवून बसलो. श्री विष्णूला सिद्धी
प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा
एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती. पेशवेकालीन
महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर यांनी
बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी
भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात
त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला
सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.छोट्याश्या
टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला.
मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ
अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके
यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी
या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना
परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. मंदिरातील
सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे.
मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक
आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून
त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा
घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते. __(सदर ऐतहासिक माहिती विकीपिडिया
भावूंच्या साईटवरून)
तासभर मंदिर परिसरात रेंगाळून आमच दुसर इच्छित
स्थळ गाठण्यासाठी पुन्हा फटफटीवर ढुंगण ठेवले. वैशाख वणव्याचा जोर खूप वाढलेला.
त्यात रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मधला. मजल दरमजल कारीत एकदाच
पेडगाव गाठले. पुण्याच्या जवळ असून अजूनही विकासाच्या प्रतिक्षेतले गाव.
लेफ्ट-राईट करीत एकदाचे किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याजवळ येवून थांबलो. म्हणजे
थांबणे भागच होते. आज पडू का का उद्या अश्या अवस्थेतला हा दरवाजा आणि त्यावरील हा
फलक...


उजव्या
बाजूचा भव्य बुरुज आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. तर डाव्या हाताला
मारुती राया येणार्या शत्रूचे आव्हान आधी पेलून घेत आहे असे भासवत होता.
मारुतीरायांची अविर्भावी मूर्ती शक्ती आणि स्फूर्ती वाढवत होती. पहिल्या
दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश केला. आणि किल्ल्यात असणाऱ्या ५ मंदिरांपैकी पहिले
भैरोबाचे मंदिर नजरेस पडले. पिवळ्या रंगाने रंगवून गावकर्यांनी ह्या मंदिराचा
पूर्ण ढंगच बदलून टाकलेला. कालच यात्रा झाल्याने मंदिरात तसा भाविकांची ये जा चालू
होती. काही दुकाने ही अजून ठाण मांडून होती. परिसरात मंदिर अवशेष भरपूर विखुरलेले
होते. त्यात सतीशिळा, विरगळ, अर्धवट दीपस्तंभ. नक्षीदार कमान, शंकराची पिंड इ.




एका
झाडाखाली बसलेला लहान मुलगा काहीतरी ऐतहासिक सांगत होता म्हणून जरा जवळच गेलो. तर
तो त्याच्याच वयाच्या सवंगड्याना हे सांगत होता की अजून आत किला लय हाय.. आत छ.
संभाजी महाराज अंघोळ करायचे ते ठिकाण आणि राहायचे ते ठिकाण जशेच्या तशे आहे. आणि
खूप सार सोन अजून आत लपवलेल आहे.....आणि लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूच्या मंदिरात
चार कोरीव खांब आहेत ते गोल फिरवले की मधले गोल कोरलेले दगड सरकतात आणि त्यातही आत
मोठे भुयार आहे आणि सोन लपवलेलं आहे.... असो त्यालाही हे कुणीतरी सांगितलेलं
असणार...दोन ओळी त्याच्यासमोर रीत्या करून पुढच्या मंदिराकडे निघालो. पण एक मात्र नक्की त्या लहानशा चिमुरड्याने
इतिहास ओरबाडून जरी सांगितला तरी छत्रपती संभाजी महाराज हे नाव पूर्ण शब्दात आणि
आदराने घेतलं. वाढत्या वयानुसार हे ऐतहासिक गैरसमज दूर होतील पण हे आदरयुक्त संस्कार
बाळपणापासूनच अंगी भिनायला हवेत.
पुन्हा
मोर्चा दुसर्या मल्लिकार्जुन आणि रामेश्वर मंदिराकडे वळवला. आजही संवर्धनाच्या प्रतिक्षेतली
ही मंदिरे. आखीव आणि रेखीव कामांनी पूर्णपणे समृद्ध. तसेच पुढचे लक्ष्मीनारायण मंदिर गाठले. सद्य स्थिती
बरी. आतील अलंकृत खांब बाहेरील मूर्तीचे काम बेफाम करून सोडणारे. कलावंताच्या रसिकतेला भरभरून
दाद द्यावी वाटते. इ.स. च्या ५व्या शतकातली चालुक्य शैलीतील हि मंदिरे
शिल्पकलेचा अद्भुत नमुनाच.
उन
जरा जास्तच होते. बाजूची भीमा नदी निर्जीव होती. पण मंदिरात हवा मात्र गारवा
घेवूनच घुसत होती. अशावेळी क्षनभर चुटकी
लागणार नाही असे होणारच नाही. क्षणभराचे तास – दीड तास उलटून गेले आणी गडाचा
राहिलेला भाग पाहण्यास निघालो....
मराठ्यांच्या इतिहासात ह्या गडावर परस्पर विरोधी
घटना घडल्या. एक शौर्यशाली आणि एक धेर्यशाली.
स्वताला शहेनशहा समजणारा बहादूर कोकालताश ह्याने इथे शाही खजिना जमवला
होता. छ. शिवाजी
महाराजांना राज्याभिषेकाचा खर्च भरून काढायचा असल्याने इथे ठेवलेला खजिना
मराठ्यांनी पद्धतशीर पांगवला होता.
दुसरा विरोधी
इतिहास हा की छ. संभाजी महाराजांची ज्वलंत धर्मनिष्ठा. ह्याच गडावर महाराजांची
अतोनात हाल औरंगजेबाने केले होते. हा राजवाडा पाहून इथे असलेले पूर्वीचे वैभव
लक्षात येते पण... इथेच उंटावर बसूऊन विदुषकी टोप्या घालून अचकट
विचकट वाद्ये वाजवीत काढली गेलेली धिंड, डोळे
काढण्याचे सुलतानी फर्मान, दोघांचेही छाटण्यात आलेली जीभ, आणि अखेर इथूनच नेवून भीमा
इंद्रायणी च्या काठी केलेली निर्घुण हत्या....
कवी कलश ह्यांचे काव्य असे सांगते
यावन रावण की सभा संभू बंध्यो बजरंग |
लहू लसत
सिंदूरसम खूब खेल्यो रणरंग ||
जो रवी
छवी देखतही होत बदरंग |
त्यो तव
तेज निहारके तखत त्येजो अवरंग ||
( कवितेचा अर्थ: रावणाच्या सभेत
ज्या प्रमाणे हनुमंताला बांधून आणले, त्या प्रमाणे संभाजी राजास
औरंगजेबापुढे उपस्थित केले गेले. हनुमंताच्या अंगाला शेदूर शोभून दिसावा असे घनघोर
युद्ध करून रक्ताने अंग माखले आहे. हे राजन तुला शोभून दिसत आहे. ज्याप्रमाणे
सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो, त्याप्रमाणे तुझे हे तेज पाहून
औरंग्याने आपल्या सिहासानाचा त्याग करून गुडघे टेकून नतमस्तक झाला आहे.)__(संदर्भ विकी भावूंच्या साईटवरून).
गडाचा निरोप घेतला तेंव्हा उन्हाची पर्वा
नव्हती महाराजांच्या आठवणीनी... हृदय हेलावून गेले होते... चित्त थाऱ्यावरुन केव्हाच उडाल होत...
________________________________________________________________________________
पुणे पासून अंतर _ 225 किमी.
सहभागी _गणेश, शिवाजी, प्रथमेश आणि मी.
खर्च प्रत्येकी (दुचाकी)- ५००
पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वतः करावी.
भेट देण्याचा कालावधी_ १२ महिन्यात कधीही.
पुण्यापासून साधारण ९५ - ९७ कि.मी
अंतरावर पांडे पेडगावचा भुईकोट उभा आहे. आधीच मला भटकायची उदंड हौस, त्यातून प्रत्येक वेळेला
अर्थात प्रत्येक सहलीत नशीबसुद्धा अजाणतेपणी पण अंगावर रोमांच उभे राहतील अशा
वैविध्यपूर्ण ठिकाणी घेऊन जाते.
ह्या वर्षी मार्च २०१७ मध्ये माझी औरंगाबाद - वेरूळ - खुलदाबाद अशी
नाविन्यपूर्ण सहल झाली. आम्ही अनेक ठिकाणी जात असतो, त्यावेळा अष्टविनायकातील विविध स्थाने बघितली
जातात, पण
सिध्दटेक मात्र अगदीच एका बाजूला पडलं होते, म्हणून औरंगाबादवरून घरी परत येताना ठरवलं, मुददाम वाट वाकडी करून सिध्दटेकच्या
श्रीसिद्धिविनायकाचे दर्शन घेऊनच मुंबईला घरी परतायचे. खरतर औरंगाबाद MIDC ते सिध्दटेक रस्ता
बऱ्यापैकी कंटाळवाणा आहे. खूपच रुक्ष...... पुन्हा संपूर्ण नवीन ठिकाण, त्यामुळे नक्की कुठे
गेल्यावर काय येईल ते माहिती नाही...... आणि अचानकच समोर श्रीगोंदेकडे अशी पाटी
डोळ्यासमोरून गेली आणि लगेच पुढच्या वळणावर पेडगाव भुईकोटाकडे बाण दर्शवणारी पाटी
समोर आली. थोड्याच वेळात किल्ल्याच्या घेरदार बुरुजाजवळून आमची गाडी गेली. अंगावरून सरसरून काटा आला, पटकन मोरपिस फिरून
गेल्यासारखं वाटलं...... खरतर... ह्या सहलीत एक देवगिरी बघितलास तेव्हढाच बास, आता अजून काही नाही बघत
राहायचं, आधीच
उशीर झालाय, सिद्धिविनायकाचे
दर्शन घेऊन सरळ गाडी पळवायची आहे... अशी सक्त ताकीद औरंगाबाद सोडतानाच मिळाली
होती.... पण पेडगावचा भुईकोट बघायची संधी मी कशाला सोडते.... दर्शन घेतलं आणि गाडी
उलट्या दिशेने फिरवली.
भीमा नदीच्या सुंदर किनाऱ्यावर उभा आहे हा किल्ला.... १३व्या शतकात
देवगिरीच्या यादवांच्या काळात या किल्ल्याचे बांधकाम झाले. साधारण दीड कि.मी. औरस
चौरस हा किल्ला पसरलेला आहे. मोडक्या
तोडक्या तटबंदीची किनार पसरून हा किल्ला आज तग धरून आहे. मोडलेल्या महादरवाज्याची
चौकट पार करून मी आत पाऊल टाकणार ... तेवढ्यात कुठून तरी फूसSSफूसSS ऐकू आली आणि बघता बघता जाडजुड काळा
कुळकुळीत साप सरपटत गेला, उचललेलं पाउल पटकन मागे
आलं..... खरं आहे....ज्या क्रूर जहाल बादशहाच्या राजवटीत ह्या किल्ल्याचे स्वरुप
पार बदलले, त्याच्या स्वभावानुसार तिथली जनावरही काळीकुट्ट आणि विषारीच निघायची ..... हा विचार मनात येतो न येतो
तोच कुठून तरी जोरजोरात घंटानाद ऐकू आला..... मनातले सगळे विचित्र विचार क्षणात
बाजूला सारले गेले. पायातली चप्पल काढली, गुडघ्यावर
बसून तिथल्या मातीचा मळवट भरून घेतला..... क्षणात मन अतिशय शांत झालं....
महादरवाजातून आत नजर टाकली, आत जाण्यासाठी पाऊल उचलले गेले, पण मन तयार होईना. थोडा वेळ तिथे उभी होते मी.
खरंच कळत नव्हतं... माझा उर अभिमानाने भरून आला पाहिजे की डोळ्यात पाणी आले
पाहिजे......
..... अनेक ठिकाणी मोडके तोडके अवशेष आहेत ह्या भुईकोटात..... काही मोडक्या
तोडक्या इमारती ... अर्धवट पडलेले वाडे, त्यांच्या भिंतींचे अवशेष..... काही स्थंभ....
सुंदर कोरीवकाम असलेली अनेक बांधकामे आहेत ह्या किल्ल्यात..... भोसले घराण्यातील
एकूण सहा महत्वाच्या व्यक्ती पाहिल्या आहेत ह्या मातीने आणि भीमा नदीच्या
प्रवाहाने......ह्या किल्ल्यातल्या मातीशी जे कायम एकरूप राहिले त्या बाबाजीराजे
भोसले, मालोजीराजे
भोसले आणि विठोजीराजे भोसले यांच्या सुजलाम सुफलाम राज्यकारभारासाठी ह्या
परकीयांच्या जागेबद्दल मला आपलेपणा वाटला पाहिजे... की
इथेच माझ्या थोरल्या राजांनी बहादुरखानाची फसगत गेली, म्हणून मला हसू आलं पाहिजे
.... की जिथे माझ्या धाकल्या राजांचे अनन्वित छळ झाले म्हणून मी अतीव दु:खाने
कोसळले पाहिजे.... हा भुईकोट अनेक भावनांचा कल्लोळ उभा करतो मनात.....
त्या काळी तर अनेक शाह्या, त्यांची स्थित्यंतरे, त्याच्यातले पराकोटीचे
वादविवाद....आणि प्रत्येक शाह्यांच्या एकमेकांवरच्या चढायांमध्ये भरडली जाणारी
फक्त मराठी मनगटे आणि मराठी मने.... स्वतःचे अस्तित्व ठिकवून ठेवण्यासाठी
सिंहासारखी शान असलेल्या मराठ्यांनी वाकायचं कुणासमोर.... तर अतिशय खुनशी...
विक्षिप्त.... विचित्र.... रानटी स्वभावाच्या बादशहांसमोर....ठेवायची आपली मान
झुकवून..,,,आपली
अस्मिता गुंडाळून....आणि वाकायचं त्यांच्याच समोर...जी हुजूर ..... जी आलिजा
....जी आलमपन्हा..... शी: शी: शी: ...... गुलामगिरीचे भूषण वाटू लागले
होते, पूर्वजांच्या
पराक्रमाचा पार पार विसर पडला होता. खरं पाहता हेच मराठे फार फार शूर, जातिवंत...., वाकणारही नाहीत आणि
मोडणारही नाहीत. तलवार आणि घोडा हीच त्यांचे कुलदैवते, घोड्यावरील खोगीर हेच घर
आणि तेच सिंहासन सुद्धा. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता, महाराष्ट्रधर्माची शान
असलेल्या ह्या तलवारी बादशहाच्या पदरी गहाण पडलेल्या होत्या, मने मेली होती, गुलामगिरीत अपमानसुद्धा
वाटे नाहीसा झाला होता. प्रत्यक्ष देवगिरीच्या तख्ताचे औरस वारस जाधवरावच बादशहाचे
बंदे गुलाम म्हणून वावरण्यात धन्यता मानत होते, तिथे इतरांची काय कथा.....
बाबाजीराजे भोसले हे या मातीतले भोसले घराण्याचे आपणा सर्वांना ज्ञात असलेले मूळ
पुरुष.... बाबाजीराजे
भोसले यांचे वडील आपल्या कुटुंबासह राजगुरुनगरजवळील चासकमान गावी रहात असत.
वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर आईसोबत ते वेरूळ गावी स्थायिक झाले. बाबाजीराजे
भोसल्यांना दहा गावाची पाटीलकी होती, पुणे प्रांतात भीमा नदीच्या काठी देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती वगैरे गावांचे तसेच
वेरूळ, वावी, मुंगी, बनसेंद्रे वगैरे
यादवपट्टीतल्या गावांचे पाटीलपण आणि पांडे पेडगावच्या भुईकोटाचा मोकासा बाबाजीराजेंकडे
होता. वेरूळ
येथे पाटीलकी आणि शेतीवाडी
सांभाळून बाबाजीराजे आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने रहात असत. इमानेइतबारे कारभार करावा, सुखाने राज्य करावे, स्वधर्म सांभाळावा, तसेच स्वतःच्या राज्यातली
प्रजा आनंदात सुखात राहील याची ते कटाक्षाने काळजी घेत होते. त्यांना मालोजी आणि
विठोजी नामक दोन मुले होती.
मालोजीराजे आणि विठोजीराजे हे सुद्धा खूप हुशार, घोडा फेकण्यात आणि तलवारी
चालवण्यात ते अतिशय पराक्रमी होते. बाबाजीराजे भोसले यांच्या वागण्याला साजेसेच
त्या दोघांचेही वागणे होते, वडिलोपार्जित
पाटीलकी सांभाळत असताना, आपल्या
प्रदेशाची झालेली अवस्था त्या दोघाही बंधूंना अजिबात बघवत नव्हती, आपल्या कुलदैवताची श्रीशिखर शिंगणापूरची
दुरावस्था त्यांना सहन होत नव्हती, श्रीघृष्णेश्वराच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना
प्यायला पाणीही नाही, विसावायला
धड ओसरीही नाहीत, देवळाची
झालेली दुर्दशा, भाविकांना
होत असलेला त्रास त्यांना सहन होत नव्हता... पण हे सगळ करायचं, तर गाडाभर पैसा पाहिजे. ये
कैसे व्हावे.... आणि एक दिवशी अपरूक झाले, शेतात कुदळ चालवताना एके ठिकाणी अचानक खोदायला
अडचण यायला लागली. माती दूर करून पहातात तो हंड्याचे तोंड लागले. सोन्याच्या
पावलांनी लक्ष्मीदेवी चालत आली.... क्षणार्धात पैशाची अडचण दूर झाली, पाहता पाहता श्रीशिखर शिंगणापूरच्या
महादेवाच्या डोंगरावर तळे खोदायला सुरुवात झाली. घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार, शेवाल तीर्थाची पुनर्बांधणी, देवावर अभिषेकाची संततधार, नंदादीप सगळे सगळे मंगल
झाले, मंदिराचा
उत्तम कायापालट झाला. धर्मकृत्ये करत असतानाच मालोजीराजांची पकड तलवारीवर मजबूत
होत होती. त्यांच्या
पदरी हत्यारबंद फौज तयार होत होती, अतिशय धाडसी निर्णय, स्वत:ची फौज, स्वत:च राज्य....आणि अपेक्षित होते तेच झाले, त्यांना निजामशाहाकडून
बोलावणे आले. मालोजीराजे आणि विठोजीराजे दौलताबादला बादशाहासमोर हजर झाले.
बादशहाने त्यांना पंचहजारी जहागीरदारी देऊन पुणे आणि सुपे परगणा त्यांच्या
हाताखाली दिले.... पांडे पेडगावची जहागीर अधिकृतपणे त्या दोघांकडेच राहिली.
मालोजीराजांचे वजन निजामशाहीत वाढीला लागले. दरवाज्यात हत्ती झुलू लागले. मालोजीराजांना शहाजी आणि
शरीफजी नावाचे पुत्र होते. विठोजीराजेंचे अंगणही मुलाबाळांनी गजबजले होते. मुले लहान असतानाच
मालोजीराजे यांचे निधन झाले.
मालोजीराजांच्या पश्चात विठोजीराजे यांना चिंता होती पुणे
प्रांताच्या जहागिरीची, कारण शहाजीराजेंचे
वय त्या सुमारास फक्त पाच होते. वालीद हक्क झाले, औलाद नातवान, तेव्हा जहागिर जप्त होणार असे दिसू लागले होते, परंतु मलिक अंबर याने
मालोजीराजांची जहागिर लहानग्या शहाजीराजेंच्या नावे करून ती विठोजीराजांना
सांभाळायला दिली. निजामशाहाने
जहागिरीच्या सनदा आणि वस्त्रे शहाजीराजांस इनायत करून, वयाच्या पाचव्या वर्षी
पंचहजारी जहागिरदार म्हणून मान्यता दिली. पुणे आणि सुपे जहागिरीचा कारभार
विठोजीराजे सांभाळू लागले. याही वेळेस पांडे पेडगावची जहागिरी भोसले
कुटुंबीयांकडेच राहिली.
विठोजीराजांच्या मृत्युपश्चात शहाजीराजांनी जहागिरीचा कारभार
स्वतःच्या हातात घेतला. त्या वेळेस पुणे आणि शिरवळ हे दोन परगणे शहाजीराजांकडेच
होते.......
खरं तर
शहाजीराजे फार मानी आणि शूर होते. पण अस्मानी सुलतानीपुढे त्यांचे बळ थिटे होते.
कायमच राग, अपमान, अस्थिरतेची, असुरक्षितेची भावना, अशा परिस्थितीत या बादशाहीतून
त्या बादशाहीत जाणे येवढाच उपाय त्यांच्याकडे उरत असे. निजामशाहीतून आदिलशाहीत,
आदिलशाहीतून पुन्हा निजामशाहीत, निजामशाहीतून
मोगलशाहीत... पण अनेक स्थित्यंतरांनंतरही मुळात त्यांच्याकडे असलेले परगणे आणि
जहागिरी शहाजीराजांकडेच होत्या.....
........ लखुजी जाधवराव यांच्या
खुनानंतर शहाजीराजांनी परत एकदा निजामशाही सोडून दिली. प्रत्यक्ष सासऱ्याच्या
हत्याकांडामुळे शहाजीराजे एकदम बिथरले होते..... त्यापेक्षा नकोच ते दास्य, नकोच ती नोकरी .....गुलामगिरी
हेच तर साऱ्या दुःखाचे मूळ,... त्यांनी
एकदम धाडसी बेत आखला... बंड.. नकोच ती गुलामगिरी! ते सुलतान नकोत आणि त्यांची जहागिरी नको! आपला स्वतंत्र
मुलुख, आपली
माणसे......बस्स......ठरले.... लखुजी जाधवरावांच्या खुनाच्या वेळी राजे
परांड्यानजीक होते, तेथून
पुण्यात आले.......वडिलोपार्जित पुणे परगणा त्यांच्या ताब्यात होताच.,,,राजांचे वाडेही पुण्यातच
होते...हा मुलुख "स्वतंत्र" बनला. तीनशे वर्षानंतर पहिला दिवस उगवला
पुण्यात "स्वातंत्र्याचा". राजे तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यानी पुण्याच्या
आजूबाजूचा आदिलशाही मुलुखपण भराभर ताब्यात घेतला...... हे आदिलशहाला कैसे सहन व्हावे?...... वजीर खवासखानाने भलीमोठी
आदिलशाही फौज पाठवली पुण्यावर.....फौजा पुण्यात शिरल्या...पुण्याच्या डौलदार वेशी
सुरुंगाने आकाशात उडाल्या. असंख्य चिता पेटल्या. महंमद आदिलशहाने आणि खवासखानाने
शहाजीराजांच्या पुण्यावरून गाढवाचे नांगर फिरवले. एक लोखंडी पहार जमिनीत ठोकून
ठेवली... त्यावर एक फुटकी कवटी आणि फाटकी वहाणही टांगली.... बंडखोर शहाजी
भोसल्याचे पुणे बरबाद झाले. स्मशान झाले... स्वराज्य संपले....... शहाजीराजांचे एक पवित्र बंड
जळून गेले....आता पुढे काय? पुन्हा
नोकरी....? बळ
नसलेल्या गरुडाने पुन्हा मुकाट्याने पिंजऱ्यात शिरावे तसे शहाजी राजे मुघल दरबारात
रुजू झाले.
शहाजीराजे
मुघलांना सामील झाल्यावर त्यांच्या ताब्यात असलेले निजामशाही मुलुकातील त्यांचे
परगणे मुघलांकडून शहाजीराजांनाच जहागिर म्हणून देण्यात आले.....तोपर्यंत खिळखिळी
असलेली निजामशाही संपवण्याचे शहाजहानने ठरवले होते. ....अखेर दौलताबाद पडले..... आणि निजामशाही बुडाली असे
सगळ्यांना वाटले खरे... पण.... पण शहाजीराजांनी परत एकदा बुद्धीबळाचा अव्वल डाव
मांडला. मोठ्ठा डाव......एका नामधारी बादशाहाला स्वत:च्या मांडीवर घेऊन सारे राज्य
स्वत: करायचे. निजामशाहाचा लहानगा वंशज मुर्तुजा त्यावेळी जीवधन किल्ल्यावर होता, पेमगिरी किल्ल्यावर
मुर्तुजाला बादशहा बनवले आणि ते स्वत: झाले मुख्य वजीर. मुर्तुजाला मांडीवर घेऊन
राजे स्वत: पुन्हा एकदा स्वत:चे राज्य करू लागले. विजापूरच्या आदिलशहाने शहाजीराजांना
छुपा पाठींबा द्यायचे ठरवले. मुरार जगदेव, रणदुल्लाखान वगैरे आदिलशाहीचे मातब्बर सरदार
राजांच्या बाजूने उभे राहिले,,,, आता मोघल
विरुद्ध शहाजीराजे असा संघर्ष सुरु झाला, शहाजीराजांनी गेलेला पुष्कळ प्रदेश विशेषत: भीमा
आणि गोदावरीच्या दुआबातील मोघलांनी जिंकलेला जवळ जवळ सर्व मुलुख पुन्हा जिंकला.
शहाजीराजांच्या या प्रचंड पराक्रमाने तिथे शहाजहान बेचैन झाला. एक क्षुद्र मराठा, निजामशाहीच्या नावाखाली
सत्ताधीश बनतो म्हणजे काय.....! आता स्वत: शहाजहान राजांचा बिमोड करण्यासाठी
निघाला. त्याचबरोबर त्याने विजापूरला पत्र धाडले. मी शहाजीचा खातमा करणारच आहे, तू त्याला मदत करायची नाही
थांबवलीस, तर
आदिलशाही नाहीशी करायला मला वेळ नाही लागणार, पण जर तू मला शहाजीच्या विरोधात मला मदत केलीस तर
निजामशाही आपण अर्धी अर्धी वाटून घेऊ...... झाले... ठिणगी पडली. आदिलशाही फौजा
शहाजीराजांच्या विरोधात मोगल सैन्याला जाऊन मिळाल्या. राजांनी मुर्तुजाला घेऊन
माहुलीचा किल्ला गाठला. खानजमानने माहुलीला वेढा घातला, आता हा अखेरचा संग्राम.... शहाजीराजांविरुद्ध वेढा
इतका आवळला गेला की अतीव दु:खाने राजांनी तलवार टेकवली, लहानग्या मुर्तुजा
निजामशहाला मोगलांनी ताब्यात घेतले..... शहाजहान आणि आदिलशहाने निजामशाही मुलखाची
वाटणी करून घेतली. भीमेच्या उत्तरेचा मुलुख शहाजहानने मोगलसैन्याकडे घेतला, दक्षिणेचा आणि कोकणातला
मुलुख आदिलशाहाने घेतला, आणि
शहाजीराजांना स्वत:च्या पदरी साधे सरदार म्हणून ठेऊन घेतले,...आदिलशहाने शहाजीराजांची भीमा आणि नीरा
दुआबातली जहागीर त्यांच्याच अधिपत्यात ठेवली पण त्याचसोबत कर्नाटकातली कामगिरी
सोपवली आणि ताबडतोब कर्नाटकात कूच व्हायची आज्ञा दिली. थोडक्यात काय, सह्याद्रीशी शहाजीराजांचा
संबंध कायमचा तुटला... शहाजीराजे विजापूरला रवाना झाले. आत्तापर्यंत जे वजीर होते, ते साधे सरदार म्हणून
पुन्हा आदिलशाही दरबारात उभे राहिले. आदिलशहाने त्यांना कर्नाटकात बंगलोर येथे
जाण्याच हुकुम दिला....... निजामशाहीच्या वाटणीच्या सुमारासच जो मुलुख शहाजहानकडे
गेला त्यात हा भुईकोट आणि पांडे पेडगावची जहागिरही मोगलाईत गेली असावी.
शहाजीराजेनी
बंगलोर येथे जाताना आपली पुणे जहागिर शिवाजीराजांच्या ताब्यात दिली, आणि ती जबाबदारी सांभाळायला
सुयोग्य कारभारी दिला, दादोजी
पंत. सिद्धटेक गणपतीच्या कुशीतल्या भीमेच्याकडेच्या मलठण गावाचे कारभारी होते
दादोजी कोंडदेव मलठणकर .`...त्यानंतर
हा पेडगावचा भुईकोट परत कधीच स्वराज्याचा भाग नाही होऊ शकला, पण भोसले कुळासाठी काही
आनंदाच्या तर काही वेळा अतीव मनस्तापाच्या आठवणींचा साक्षीदार मात्र राहिला,....... शहाजीराजे बंगलोरला
रवाना झाले ते १६३३ मध्ये........ पुण्यातील कारभार मोकासदार म्हणून शिवाजीराजेंच्या
नावेच सुरु झाला. कारभारातील आज्ञापत्रे लहानग्या शिवाजीराजांच्या नावानेच सुटू
लागली..... शिवाजीमहाराजांनी १६५७च्या सुमारास जुन्नरवर हल्ला केला, त्यावेळेस स्वराज्याचा
मीनाजी भोसले नावाचा सरदार पेडगाववर चालून गेला, त्यावेळेस थोडीफार लुटही मिळाली. १६६०च्या सुमारास
शाहिस्तेखान औरंगाबादेवरून स्वराज्यावर चालून आला,,,, तो औरंगाबाद – अहमदनगर – पेडगावकरून स्वराज्याच्या
सोनवडीत दाखल झाला.... तीन वर्षांनी तीन बोटे कापून घेऊन बंगाल आसामच्या दिशेने
जाताना कोणत्या रस्त्याने गेला, कल्पना
नाही. १६६५च्या फेब्रुवारी महिन्यात मिर्झाराजा जयसिंग हे ही औरंगाबादवरून
पुण्याच्या दिशेने निघाले. कदाचित त्यांचा पुण्याकडे जाण्याचा रस्ता पेडगावमार्गेच असावा.......
त्यावेळेस
मराठ्यांच्या भाषेला, धर्माला, बायकांना, किंबहुना देहांना आणि
प्राण्यांना काहीच किंमत उरली नव्हती.... ही स्थिती पालटून मराठ्यांचे सार्वभौम
वैभवशाली स्वराज्य पुन्हा स्थापन होईल याची कुणाला स्वप्नातही
कल्पना नव्हती,,, सतत ३० वर्षे महाराजांनी आणि त्यांच्या
सर्व अनुयायांनी अतुलनीय पराक्रमाने, अलोट कर्तुत्वाने,
असामान्य निष्ठेने, आणि उत्तुंग
महत्त्वाकांक्षेने या भूमंडळाचे ठाई एक विलक्षण क्रांती केली होती.....आणि
त्यानंतर या असामान्य कर्तुत्वाचा कळस म्हणूनच की काय किल्ले रायगडावर
महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरु झाली.... देवगिरीच्या रामदेवराव
यादवांच्या आणि विजयनगर साम्राज्याच्या पाडावानंतर’ जवळ
जवळ १०९ वर्षे हिंदुस्थानात कोठेही हिंदुपातपातशाही नव्हती...... आणि अखेर १६७४
साली ज्येष्ठ शुद्ध त्रयोशदीच्या मंगल उष:काली महाराजांचे राज्यारोहण झाले.....
महाराज तख्तनशीन झाले ही गोष्ट कोणत्याही बादशहाला रुचणे शक्यच नव्हते, पण हा सोहळा थांबवण्याचे बळही कोणाकडेच नव्हते…….. राज्याभिषेकाचा अपार खर्च भरून काढताना मराठी अकलेचा एक अस्सल नमुना
महाराजांनी दख्खनच्या सुभेदारास दाखवायचा बेत आखला. त्यावेळेस औरंगजेबाने दख्खनची
सुभेदारी बहादूरखान कोकलताश याला दिली होती. बहादुरखानाने पेडगाव येथे कायमची
छावणी ठोकली होती. पेडगावास बळकट किल्ला करून त्यास नाव दिले,`बहादूरगड’,. महाराजांनी ९ हजाराची फौज पाठवून दिली
बहादुरगडावर....आणि एक मजेदार चाल योजली.....आपल्या फौजेच्या दोन टोळ्या केल्या.
एक टोळी २ हजारांची आणि दुसरी ७ हजाराची..... सात हजाराच्या फौजेला पेडगावपासून
थोडे दूर अंतरावर सावधपणे उभे केले,,,,आणि आधी दोन हजारांची
टोळी पाठवून दिली बहादुरगडावर.... आणि बहादूरखान पुरता फसला. खानाने आपल्या सर्व
फौजेला महाराजांच्या दोन हजारांच्या फौजेच्या पाठी दौडवले..... पेडगावात फारसे
कोणीच उरले नाही....सर्व फौज घेऊन खान दौडला. मराठ्यांची फौज त्याला हुलकावणी देत
पंचवीस कोसापर्यंत घेऊन गेली..... आणि इथे मागे उरलेल्या सात हजाराच्या फौजेने
बहादुरखानाच्या छावणीची पुरती लुट केली. खूप मोठे घबाड लागले हाती.... एक कोटी
रुपयांचा खजिना, त्याशिवाय औरंगजेबाला नजर करायला
आणलेली २०० जातिवंत अरबी घोडी मराठ्यांच्या हाती लागली. एवढी मौल्यवान कमाई करून
मराठ्यांनी सर्व तंबू पेटवून दिले. कापरासारखी जाळून खाक झाली छावणी..... तिकडे
पाठलाग करून बहादूरखान दमला...., अखेर
खान माघारी फिरला, येऊन बघतो तो काय....सगळी माती
झालेली. एकही छदाम खजिन्यात नाही आणि एकही घोडा जागेवर नाही.....मस्त बनवले
मराठ्यांनी बहादुरखानाला..... कदाचित तेव्हापासूनच ‘पेडगावचे शहाणे’ हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा..... या घटनेपासून मराठेशाही जास्तच खुपू
लागली बहादुरखानाला आणि औरंगजेबाला...... आणि म्हणूनच की काय शंभूराजे हातात
आल्यावर पुरेपूर बदला घेतला त्यांनी.....
गृहकलहामुळे, दक्षिण दिग्विजयाला जाताना
शिवाजीमहाराजांनी शंभूराजांना स्वत: बरोबर न नेता, शृंगारपूरी
रहायची आज्ञा केली. त्यानुसार ३१ ऑक्टोबर १६७६ रोजी मनाविरूध्द शंभूराजे शृंगारपूरात
प्रभानवल्लीचे सुभेदार म्हणून दाखल झाले. महाराजांच्या अनुपस्थित या परिस्थितीचा
औरंगजेबाच्या हेरांनी पुरता फायदा घेतला. महाराज गडावर नाहीत याचा फायदा घेत
दिलेरखानाचे शंभूराजांना मोगलाईत येण्याचे आमंत्रण देणारे, अतिशय प्रेमाचे, आपुलकीचे खलिते रोजच शृंगारपूरची
वाट धरू लागले. आपल्या आबांवर रुसलेले, एकटे पडलेले, रायगडावरून वेगळे केले गेलेले, मनातून हरवलेले, खट्टू झालेले युवराज आता मात्र चुकले..... आणि मोघल सैन्याला जाऊन मिळाले. पुन्हा जाताना एकटेच नाही तर सोबत आपली बहिण
अंबिकाबाई आणि आपली पत्नी दुर्गाबाई यांनाही घेऊन गेले. या सगळ्या इतिहासाचा
बहादूरगड साक्षीदार आहे....... स्वराज्यापासून दूर होऊन भरकटलेल्या शंभूराजांच्या
विमनस्क मनस्थितीचा औरंगजेबाने मात्र पुरेपूर फायदा घेतला. १३ डिसेंबर १६७८
रोजी कुरकुंभ मुक्कामी भेटल्या भेटल्या दिलेरखानाने आनंदाने चौघडे वाजवून, शंभूराजांचे स्वागत केले. औरंगजेबाने पाठवलेला शृंगारलेला हत्ती, ‘राजा’ ही पदवी, तसेच
सप्तहजारी मनसब बहाल केली..... शंभूराजांच्या दुखावलेल्या मनावर दिलेरखानाची
खोट्या आपुलकीची हळुवार फुंकर पडली, आणि ते फसले.....
संभाजीराजे स्वत:, दुर्गाबाई, अंबिकाबाई
तसेच संभाजीराजांसोबत आलेल्या शिबंदीला बहादुरगडातच अतिशय उत्तम व्यवस्थेत
पण चौकी पहाऱ्यातच ठेवले गेले.....
दिलेरखानाला मिळालेले संभाजीराजे मोघल सैन्याकडून हिंदू प्रजेवर, स्त्रियांच्या अब्रूवर होणारे अनन्वित अत्याचार उघड्या डोळ्याने पाहू शकत
नव्हते’. दिलेरखानाच्या क्रौर्याने त्यांच्या संवेदनशील
मनाला असह्य वेदना होत होत्या. त्यात रोजचे दिलेरखानासोबत होणारे खटके, त्याच्याकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक त्यातून आपला जनाना दिलेरखानाच्या
ताब्यात असल्याने स्वतः किती अवघड परीस्थितीत अडकल्याची पुरेपूर जाणीव त्यांना होत
होती... त्याही परिस्थितीत त्यांना स्वराजात परत आणण्याचे शिवरायांचे आणि
येसुबाईंचे अनेक प्रयत्न सुरु होते..... आणि एका शुभदिनी शंभूराजे दिलेरखानाच्या
छावणीतून केवळ १० सैनीकांसोबत पळून जाण्यात यशस्वी झाले.... पण त्यांचा जनाना
मात्र त्यांच्या मागे बहादुरगडावरच कैद केला गेला आणि कालांतरानी तिथून त्यांच्या
जनान्याला अहमदनगरच्या किल्ल्यावर कैदेत ठेवले गेले.....
शिवराजांच्या मृत्युपश्चात संभाजीराजांनी बहादुरगडाला स्वराज्यात
आणण्यासाठी तसेच आपल्या माणसांना कैदेतून सोडवण्याच्या उद्देशाने त्याच्यावर अनेक वेळा
हल्ला केल्याच्या नोंदी आहेत, पण त्यात त्यांना यश
मिळाले नाही.
आणि कालांतराने स्वत:च्याच नजरेसमोर स्वराज्याचे दुसरे छत्रपती
साखळदंडधारी कैदी म्हणून उभे ठाकलेले बघितले आहेत ह्या गडाने....
......औरंगजेबाच्या आज्ञेप्रमाणे इखलासखान आणि बहादूरखान हे
संभाजीराजे, कवी कलश, आणि इतर सर्व कैद्यांसह बहादूरगड येथे पोहोचले. १५ फेब्रुवारी १६८९ रोजी
औरंगजेब अकलुजवरून बहादूरगड येथे येतो आणि कैद्यांना आपल्या समोर आणावे अशी आज्ञा
करतो. “बहादुरगड किल्ल्यावरील बादशहाच्या निवासस्थानापासून ४ मैलाच्या अंतरावरून
कैद्यांच्या अंगावर इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालतात तसा पोशाख आणि
विदुषकासारख्या उंच टोप्या ( तख्तेकुलाह ) घालाव्यात तसेच इतर लोकांना देखील
विदुषकी पोशाख घालावा. काफर संभाला उंटावर स्वार करून आणावे.”... या आज्ञेप्रमाणे
संभाजीराजांना खोगीर नसलेल्या उंटावर बसवले गेले आणि त्यांना दोराने घट्ट बांधले
गेले. तख्तेकुलाहला घुंगुर, खुळखुळे व भगवी
निशाणे बांधली गेली.... आणि ढोल, शिंगे, कर्णे या वाद्यांच्या गजरात धिंड निघाली शंभूराजांची. ही धिंड पाहण्यासाठी
बहादुरगडाची तमाम जनता आनंदात उभी होती, मधेच उंटाला पळवले जाई, त्याच्या
वाकड्यातिकड्या चालीमुळे राजांच्या अंगावरच्या खुळखुळे आणि घुंगरांचा नाद होई.
मुकर्रबखानच्या यायच्या आधी संपूर्ण जनतेत संभाजीराजांच्या कैदेची बातमी पसरली
होती....बत्तीस मन वजनाच्या सुवर्णसिंहासनावर विराजमान झालेल्या अभिषिक्त
छत्रपतींना अशा यातना देताना खूप खूष झाला होता औरंगजेब....ज्यांच्या पराक्रमाने
अतित्रस्त होऊन ज्या औरंगजेबाने आपल्या मस्तकीचा किमौश फेकून दिला होता, त्या छत्रपतींना आपल्या कैदेत अडकलेले बघून तृप्त झाला असेल तो
क्रूरकर्मा....
....... संभाजीराजांची धिंड संपली. बादशहाने पूर्ण दरबार भरवला. अमीर
उमराव आणि तमाम छावणीतील लोक हजार झाले. बादशाहची उपस्थिती दिवाणे आममध्ये
झाली.... शंभूराजांना आणि कवी कुलेश यांना दरबारात आणण्यात आले, त्यांचे डोळे आणि जीभ सोडून सर्व अवयव साखळदंडाने बांधून टाकले होते,
सर्वांगावर रक्ताळलेल्या जखमा होत्या ....सगळीकडून रक्तरंजित झाले
होते दोन्ही कैदी ...... बादशहा आपल्या स्थानावरून खाली उतरला . गालिचाच्या टोकावर
बसून त्याने आपले गुडघे जमिनीवर टेकवले आणि हात वर करून अल्लाला धन्यवाद दिले,..... आपल्यासमोर बादशहा स्थानावरून उतरलेला बघून त्या बांधलेल्या
परिस्थितीतही कवी कुलेश यांनी शंभूराजांसाठी अप्रतिम काव्य केले .....
यावन रावन की सभा संभू बंध्यो बजरंग !
लहु लसत सिंदुरसम खूब खेल्यो रनरंग !
ज्यो रवी ससि लखतही, खद्योत
होत बदरंग !
त्यो तुव तेज निहार के तखत त्यजो अवरंग !
बादशहानी शंभूराजांना स्वत:कडे वळवण्याचा खूप प्रयत्न केला, त्यांना मुसलमान हो म्हणून सांगितले, तुझे किल्ले
माझ्या स्वाधीन कर, मग मी तुला जीवे नाही मारणार....एक ना
दोन,... अनेक प्रलोभने दाखवली औरंगजेबाने राजांना... पण ते
कशालाही बधले नाहीत, की बादशहापुढे मान तुकवली नाही.
बादशहापुढे न झुकलेली मान आणि आग ओकणारे डोळे पाहून, औरंगजेबाने या बहादूरगडातच त्यांच्या डोळ्यांमधुन तापती सळई फिरवून
त्यांची बुबुळे काढायची आज्ञा केली. त्याची लगेच अंमलबजावणी झाली. १६ फेब्रुवारी
१६८९ पासून महाराज आंधळे झाले. महाराजांनी शिवीगाळ केली म्हणून त्यांची जीभ खेचून
काढण्यात आली. जिवंतपणीच त्यांच्या अंगावरची कातडी सोलून काढण्यात आली......
१६ फेब्रुवारी ते ११ मार्च या २४ दिवसात राजांचे मानसिक आणि
शारीरिक हाल करण्यात आले......
......हे सगळं सगळं आठवत मी बहादुरगड बघून आले...खरं तर काय बघते आहे, कुठे फिरते आहे, काही काही समजत नव्हत...कुठे
बांधलेली असतील ती २०० अरबी घोडी, कुठे असेल ती पागा...
कुठून निघाली असेल माझ्या शंभूराजांची धिंड, कुठे असेल तो
दिवाने-आम जिथे कवी कुलेश यांनी शंभुस्तुती गायली होती, कुठे असेल तो तुरुंग जिथे माझे राजे बंदिस्त होते, कुठे कुठे काढले गेले असतील त्यांचे डोळे..... कुठे खेचली असेल त्यांची
कातडी.....
अत्यंत विमनस्क अवस्थेत बाहेर आले मी गडाच्या.... डोळे भरून आले होते, मन आक्रंदत होत.... दोन मिनिट थांबले पुन्हा महादरवाजाच्या चौकटीवर....
दोन्ही हात जोडले माझ्या थोरल्या आणि धाकट्या छत्रपतींच्या पराक्रमाला..... आणि
सरळ वाट धरली मुंबईची.... या वेळेस मागे फिरून गडाकडे नजर टाकायची हिम्मत होत
नव्हती माझी....फक्त आणि फक्त अश्रुं होते
माझ्या डोळ्यांत !!!!
!! जगदंब जगदंब !!
Ref:
१. पत्रसार संग्रह
२.
श्री राजा शिवछत्रपती खंड
१ - ग.भा.मेहेंदळे’
३.
राजा शिवछत्रपती
पूर्वार्ध – बाबासाहेब पुरंदरे
४.
ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
– डॉ. सदाशिव शिवदे
५.
शिवपुत्र संभाजी – डॉ. कमल
गोखले
Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad are
located in Pedgaon village in the Shrigonda Taluka of the Ahmednagar district
of Maharashtra.
 |
| Entrance to Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
Chand Bibi Tomb, Ahmednagar Fort, Damadi Masjid, Faria Bhag
Palace and Cavalry Tank Museum are some of the historic structures I have
visited in Ahmednagar before.
 |
| Breakfast at Joshi Vadewale in Pune |
It was just the two of us (Manohar and Me) I prepared the
itinerary and Manohar took care of the driving.
We planned to cover Karmala Fort, Paranda Fort, Dharashiv caves, Ausa Fort, Kharosa Caves, Udgir Fort, Kandhar
Fort, Dharmapuri Fort and Dharur Fort on this roadtrip.
 |
| Breakfast at Joshi Vadewale in Pune |
As decided we met at Ghatkopar Railway station on the
eastern side around 5:30 AM. The directions to Bahadurgad Fort are tagged on
google maps. Bahadurgad was around 250 KM away, we were sure that we would
reach the fort by afternoon taking breaks into consideration.
 |
| Sculptures in the premises of Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
We had breakfast in the form of Vada's at Joshi Vadewale in
Pune.
By the time we reached Bahadurgad Fort it was around 12 PM.
There is a village near the entrance of the fort premises. NOTE - There is no
hotel here for refreshments. The villagers informed us that we
can take the car and travel within the fort premises.
 |
| Temple at the entrance of Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
There is a Darwaza (Door) to enter the fort premises. It has
a orange colored flag atop it swaying in the wind. The fort walls are not in
good condition and have collapsed in certain places.
History states that Bahadur Khan was the administrator of
the fort. Not sure if he built the fort. When Shivaji Maharaj got the news that
around 200 Arabs had come there, he wanted to plunder their wealth. he made
arrangements and was successful in plundering the Arabs of their wealth.
 |
The
man who provided us with information on Temple at the entrance
of Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar
district of Maharashtra
 |
| Diya Stand at the temple in Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
|
Once we entered the fort premises, we saw this temple. Shri
Bhairavnath Mandir. By the look of it, it was an old temple, painted in vibrant
colors. We also met a local sitting in the temple premises. Sadly we were not
able to understand the information he was providing us with. He was definitely
not speaking hindi or marathi. I am sure he might he speaking shuddh marathi,
which is difficult to understand.
 |
| Carved
stones in the premises of Temple at the entrance of Bahadurgad Fort aka
Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
Around the temple premises is placed a diya stand. The stand
made of rocks was painted white. Near the diya stand are placed small
sculptures of Gods. Not sure as to who are those Gods.
The temple premises and the huge tree near the temple are
the only source of shade on the entire fort premises.
There is a muddy path via which one has to travel to reach
the different monuments within the fort premises.
On way, you will seen sculptures carved in the stone
scattered across the ground along with stones used in the construction of
structures in the fort premises.
 |
Rameshwar Mandir in Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
| Information on Rameshwar Mandir at Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
|
We parked the car near Rameshwar Mandir. A little information
on the temple in Marathi. Rameshwar Mandir, was built entirely of stone. The temple premises had sculptures of Gods
within them. Also the entrance to the temple has sculptures around it.
 |
Mallikarjun
Mandir in Temple at the entrance of Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon
aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
| Information on Mallikarjun Mandir at Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
|
We then moved to see the Malikarjun Mandir located a couple
of feet away. A little information on the temple in Marathi. Again this temple was built of stone. It had
carved pillars at the entrance. Sculptures of Gods within them.
 |
| Daru Kothir in Temple at Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
We then moved to see the Daru Kothir, Not sure what it
meant. there was an old structure here, completely in ruins with wild grass
growing all around it. the structure had a small Moorish Dome atop it. Possibly
a store room.
 |
| Unknown structure at Temple at Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
We saw this Bastion in the middle of the fort premises.
 |
| View of River Bhima from Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
Finally we reached the main attraction of the fort, Lakshmi
Narayan Temple and Baleshwar Temple, these beautifully crafted temples at the
banks of River Bhima.. Remember River Bhima, we had traveled on it to reach the
Palasdeo Temple, located in the water.
 |
Lakshmi Narayan Temple in Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
Sculpture
on the walls of Lakshmi Narayan Temple in Bahadurgad Fort aka Fort of
Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
| Sculpture
on the walls of Lakshmi Narayan Temple in Bahadurgad Fort aka Fort of
Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
|
|
The artwork though
similar on both the Lakshmi Narayan Temple and Baleshwar Temple left me
speechless. It reminded me of the Shiv mandir in Ambernath.
 |
| Baleshwar Temple in Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
 |
| Baleshwar Temple in Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
We then visited the Pataleshwar Temple, the temple is still
in use, it had a Shivling, statue of Nandi and sculptures places near it.
We then walked to the bastions of the fort. The bastion was
at the banks of the River Bhima and offered fantastic view of the river. Due to
wild vegetation growing within the fort premises we couldn't see much inside
the fort.
 |
Bastion
and fort walls of Temple at the entrance of Bahadurgad Fort aka Fort of
Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
| That's us at Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
|
We visited the final structure in the fort premises. It had
its own Darwaza and walls around it. Though certain portions of the walls have
collapsed, but the Darwaza is intact. It has two orange colored flags swaying
in the wind atop it.
 |
Structure in Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
| Broken
fortification of Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad
in Ahmednagar district of Maharashtra near River Bhima |
|
We also saw this lamp, stone sculpture and information
signboard. Note sure what it it.
 |
Monument at Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
| Within the monument premises of Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
|
We then headed over to see the ruins at the banks of the
River Bhima. Graffiti artists had been here before me.
 |
River Bhima from Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra
 |
| That's me at Bahadurgad Fort aka Fort of Pedgaon aka Dharmaveergad in Ahmednagar district of Maharashtra |
|
Though we initially thought there was nothing much to see in
the fort premises, the artwork of the temples was just amazing.
We then headed over to see the next fort, Karmala Fort.
बहादूरगड-पांडे पेडगांव Fort Bahadoorgad
पांडे-पेडगांव भुईकोट किल्ला
रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या "आज्ञापत्रात" किल्ल्याचे महत्त्व विशद केले आहे.
"दूर्ग म्हणजे राज्याचे सार,
गडकोट म्हणजे राज्याचे मूल,
गडकोट म्हणजे खजीना,
गडकोट म्हणजे सैन्याचें बल,
गडकोट म्हणजे आपली वसतिस्थळे,
गडकोट म्हणजे प्राणसंरक्षक"
पांडे-पेडगांव भुईकोट किल्ला हा महाराष्ट्रातील अहमदनगर
जिल्ह्यातील श्रीगोंदा या तालुक्याच्या गावापासून सुमारे १०-१५
कि.मी.अंतरावर आहे.भीमा नदीच्या उत्तरेच्या तीरावर सुमारे ११० एकरावर
साधारणतः आयताकृती आकाराच्या ह्या स्थलदुर्गाची निर्मिती १३ व्या शतकातील
असावी.छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे ह्या
स्थलदुर्गांची देखभाल जबाबदारी निजामशहा बादशहाच्या वतीने दिली होती.ह्या
किल्ल्याच्या नजीकच्या देऊळगांव राजे येथे बाबाजी भोसले यांच्या
वास्तव्याच्या खूणा दर्शविणा-या वाड्यांचे अवशेष अखेरच्या घटका मोजत आहेत.
पांडे-पेडगांव किल्याचे मोगल कालखंडात "बहादूर गड"नामकरण झाले
असावे.निजामशाहीकडून हा किल्ला मोगलांनी जिंकून घेतल्यानंतर याची जबाबदारी
आलमगीर औरंगजेब बादशहाचा दुधभाऊ बहादूर शहा कोकलताश याच्याकडे
होती.छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक राज्याभिषेक सोहळा रायगडवर संपन्न
झाल्यावर आर्थिक रसद मिळण्यासाठी महाराजांचे लक्ष मोगली अधिपत्यात
असलेल्या पेडगांवकडे गेले.योजना तयार झाली.स्वराज्याच्या सैन्याच्या( २०००)
लहान तुकडीने बहादूरखानाच्या बहादूरगडवर हल्ला चढविला.मोगली सेनापती
बहादूरखानाने जोराचा प्रतिकार केला तेव्हा स्वराज्याचे सैन्य माघार घेऊ
लागले ,हे पाहून मोगली सैन्याने मराठ्यांचा पाठलाग करु लागले.हा पाठलाग फार
दूरपर्यत गेल्यावर मराठी सैन्याच्या दबा धरून बसलेल्या मोठ्या
तुकडीने(७०००) पेडगांवच्या किल्ल्यावर हल्ला चढविला.बहादूरखानाचे सर्व
सैन्य मराठ्यांच्या लहान तुकडीचा पाठलाग करीत गेल्यामुळे फारसा प्रतिकार
असा झालाच नाही.परिणामी भरघोस लूट करण्यात मराठ्यांना यश आले.या लुटीत २००
जातिवंत घोडे मिळाले जे औरंगजेबाला भेट देण्यासाठी बहादूर खानाने आणले
होते.सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती स्वराज्यासाठी मिळाली.
दमलेला बहादूरखान मराठ्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत
पेडगांवला आला.समोर किल्याची लूट पाहून चकितच झाला.मराठ्यांनी या
पेडगांवच्या सेनापतीस"शाहणा" करून सोडले होते.
२००८ साली या बहादूरगडाचे नवीन नामकरण "धर्मवीर गड" असे
करण्यात आले आहे.मराठ्यांच्या राजाला(छ.संभाजी महाराज ) अतिशय वेदना दिल्या
पण आपल्या धर्मासाठी बलिदान देणाऱ्या राजाच्या स्मृती जागृत राहव्यात
म्हणून नवीन नाव देण्यात आले.
११० एकर क्षेत्रफळ असलेला धर्मवीर गड आज अखेरच्या घटका मोजत
आहे. या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी चार ते पाच दरवाजे असावेत. भीमा
नदीच्या उत्तरतीरावर हा किल्ला आहे. औरंगजेबाचा राजदरबार हा भीमा नदीच्या
बाजूला असलेल्या तटबंदीलाच लागून आहे.तटबंदी लगत असलेल्या दरबाराचे काही
अवशेष आज शिल्लक असून त्याची बांधकाम शैली मोगली(यावनी)पद्धतीची
आहे.चुनेगच्चीत वीटांचे दुमजली बांधकाम आहे.प्रत्येक दालनात पाणी खेळविले
असून भितींवर चित्रकला केलेली असल्याचे दिसून येते.भुयारी
मार्ग,गवाक्ष,झरोके याची प्रत्येक दालनात योजना केलेली दिसून येते.दरबार
स्थल सखल भागात आहे,मात्र परिसर मोठा असल्याने हा शाही दरबार नक्कीच
असेल.दरबारात दोन्ही बाजूला असलेल्या बांधकामाच्या अवशेषावरून अधिकारी
,सरदार व इतराच्या बैठकीची व्यवस्था असावी.औरंगजेबाचे बसण्याचे आसन सर्वात
जास्त उंचीवर असल्याची ती जागा दृष्टीस पडते.
या दरबारातील मध्यभागातील जी मोकळी जागा दिसते ती मराठी
माणसासाठी फार पवित्र आहे.छ.संभाजी महाराज आणि औरंगजेबाची ही समोरासमोरची
दुसरी भेट होती.पहिली भेट झाली होती ती आग्रा दरबारात व ही दुसरी भेट
होती.समोर आसनावर बसलेला हिंदूद्वेष्ठा औरंगजेब आपल्या डोळ्यांवर विश्वास
ठेवत नव्हता कारण त्याच्या कैदेतून आपल्या पित्यासहित सहीसलामत सुटलेला
शिवपुत्र होता.ज्याच्या पित्याने जगावर राज्य करणाऱ्या आलमगीरा समोर
स्वकर्तृत्वाने हिंदू पातशाही निर्माण केली होती.विधिवत रायगडावर
राज्याभिषेक करून औरंगजेबाला आव्हान दिले होते.छ.शिवाजी महाराजांच्या
निधनानंतर सलग नऊ वर्षे छ.संभाजी महाराजांनी मोगलांस जेरीस आणले
होते.औरंगजेब पुत्र अकबर यांस आपल्या पित्या विरोधात उभे राहण्यासाठी साह्य
केले होते.कसा ठेवणार होता आपल्या डोळ्यावर?अशक्य,हे शक्य झाले होते.
का बरे शक्य झाले?शेख निजाम उर्फ मुकर्रखानाचे ह्या सरदारांची मेहनत की,मराठ्यांची वतनासाठी केलेली फितूरी?
शेख निजामाने छ.संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची
बातमी प्रथम औरंगजेबाला कळविण्यात आली.तेव्हा औरंगजेबाचा तळ अकलूज येथे
होता.त्याने शेख निजामास निरोप दिला मराठी मुलखातून मोगली मुलखात कैदी
छत्रपतींना आणताना काय खबरदारी घ्यायची?शंभू राजांचे केश वपन करुन,विदुषकी
कपडे घालून उंटावर बसवून वाद्यांच्या गजरात घेऊन पेडगांवला यावे.राजा पकडला
गेला तरी मराठी मुलूखाचा किती धसका होता आलमगीर औरंगजेबावर! बापरे ,किती
दहशत होती शिवप्रभूंच्या सह्याद्रीतील मराठी मुलूखाची.
औरंगजेबाने आपल्या समोरील पेडगांवच्या दरबारातील दृश्य पाहून
आपल्या लाडक्या अल्लाचे आभार मानण्यासाठी जमीनीवर डोके ठेवले.दरबारात
मातब्बर,सरदार,मंत्री ,काझी व लेखनिक खाफी खान हजर होता.१५ फेब्रुवारी १६८९
चा दिवस,साखळदंडात जखडलेला तेजपुंज मराठ्यांचा राजा संभाजी ! राजांच्या
समोर त्यांचे अपराध म्हणजेच पराक्रम वाचून दाखविले.आता वेळ होती सहकैदी
असलेल्या कवी कलशाची.काझीने शिक्षा फर्मावली राजांना आणि कवी कलश !देहदंड.!
डोक्यावर लाकडी खोके,अंगावर विदुषकी कपडे ,हाता पायात लोखंडी साखळदंड व
अंगावर अगणित जखमा अशाही अवस्थेत राजांनी व कलशाने तप्त दृष्टी औरंगजेबावर
टाकली आणि एका क्षणात औरंगजेब आतून कोलमडला.शिवपुत्र संभाजीची नेत्रातील
क्रोध सहन नाही करू शकला आलमगीर!औरंगजेबाने आज्ञा फर्मावली "काढा ते
डोळे".पहिली अंमलबजावणी कवी कलशावर! का कलश पहिला ?कारण ती शिक्षा पाहून
राजे मोगलांच्या अटी मान्य करुन राज्य हवाली करतील .पण हे शक्य नाही,हे
आलमगीरास कळणार कसे?मराठी राज्य संस्कार कुठे त्याला माहित असणार ?
राजांवर शिक्षा होण्या अगोदर कवीराजांवर अंमलबजावणी व्हायची.अनंत
यातना,मराठ्यांच्या धर्माभिमानी राजाने देव,देश आणि धर्मासाठी सलग तेवीस
दिवस पेडगांवच्या किल्ल्यात भोगल्या.त्या पवित्र रक्ताचे थेंब याच मातीत
मिसळले आणि म्हणूनच ती धर्मवीर गडावरील राज दरबारातील मध्यभाग पावन,पवित्र
झाला.
भीमा नदीच्या राजदरबाच्या उजव्या बाजूला,तटबंदी शेजारीच
सुमारे पन्नास लाख लिटर क्षमतेची बारव असून पाणी काढण्यासाठी हत्ती मोट
आहे.काढलेले पाणी उत्तर दिशेला चुनेगच्ची खापरी वाहिकेतून काही अतरांवरील
एका लहान बावडीत नेले असून तेथून पाणी काढण्यासाठी पुन्हा एक हत्तीमोट
बनविली आहे.या दोन हत्तीमोटे दरम्यानच्या जल वाहिनीवर मध्यवर्ती ठिकाणी
तत्कालीन कारंजाचे अवशेष आढळून येतात.कारंजाच्या पश्चिमेस अतिशय प्राचीन
म्हणजेच चालुक्यकालीन दगडी बांधकामात कला कुसर केलेले श्री लक्ष्मी नारायण
मंदिर आहे.पश्चिमाभिमूख नक्षीदार दगडी खांबावर सभा मंडप व गर्भगृह भागात
आहे.भीमा नदीच्या प्रवाहाने व दगडी जाळीदार खिडक्यातून थंड हवेचा झोका
उष्णते पासून सुटका करतो.याच लक्ष्मी नारायण मंदिराच्या समोर पूर्वाभिमूख
बालेश्वर मंदिर आहे.सभामंडपाचे कलासक्त खांब उभे असून छत नाहीसे झाले
आहे.गर्भ गृहात विशाल अशी महादेवाची पिंड असून कोणाड्यातील गणेश व इतर देवा
देवतांच्या मुर्ती गहाळ झाल्या आहेत.किल्ला परिसरात अशी अजूनही तीन चार
मंदिरे पाहण्यासारखी आहेत.किल्ला परिसरात अनेक मंदिराच्या घडीव दगडांचे
अवशेष आढळून येतात.
पेडगावचा हा किल्ला काही दिवस निजामशाहकडे होता त्यानंतर तो
मोगल सत्तेकडे आला.स्वराज्याच्या ताब्यात हा किल्ला शेवट पर्यत
नव्हता.तरीही धर्मांध औरंगजेबाने ह्या किल्ल्यात वास्तव्य करून मंदिरे कशी
राहिली याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.ज्या आलमगीराने वाराणसीतील
काशी विश्वनाथ मंदिर पाडून ज्ञानवापी मस्जिद बांधली त्याच्याच वास्तव्यातील
किल्ल्यावर हिंदू मंदिरे शाबूत कशी राहिली ?आणि हो,एकशे दहा एकर
क्षेत्रातील स्थलदुर्गावर एकाही मुस्लिम प्रार्थना स्थळ एकही नाही ?
@ सुरेश नारायण शिंदे,भोर
९७६७५९६९५४
Dharmaveer gad or Bahadurgad
It is land fort. Situated on the bank of Bhima river, the fort
had witnessed cruel torture to Chatrapati Sambhaji Maharaj. To pay
homage to this legend Maratha warrior I decided to see this fort.
There are five ancient temples in the fort. You will see amazing architecture on these masterpieces.
How to go there:
Pune-Hadapsar-Yawat-Patas- Daund(Turn left after Patas)- Nimgaon -AajNuj- Pedgaon(Fort village)
 |
| Bhairavnath temple |






















































एप्रिलअखेरचे
दिवस. उन अगदी रणरणतंय. अशाच एका पेटत्या दुपारी मी पेडगावला पोहोचतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औंरगजेबाचा सेनापती बहादूरखानाला हूल देऊन
वेड्यात काढल्यापासून पेडगाव जास्तच प्रसिद्धीला आलंय. ह्या पेडगावनं
थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतर केवळ नऊ वर्षातच एक दुर्दैवी घटना
पाहिलीय. ह्याच बहाद्रूरखानाच्या किल्ल्यात, बहादूरगडात संभाजी महाराजांना
विदूषकासारखी टोपी घालून तसेच त्यांचे दोन्ही हात लाकडी फळ्यांना बांधून
त्यांची धिंड काढण्यात आली. त्यानंतर येथेच तापती सळई खुपसून डोळे काढण्यात
आले तसेच तरवारीने जीभ छाटण्यात आली. काहीच दिवसांनी तुळापूर येथे त्यांची
क्रूर हत्त्या करण्यात आली. हा बहादूरगड महाराष्ट्रातील सर्वात दुर्दैवी
घटनांचा साक्षीदार आहे.
अर्थात
पेडगावचा इतिहास काही बहादूरखानापासून सुरु होत नाही. त्याने येथे मजबूत
कोट बांधला हे खरे पण त्यापूर्वीही येथे एखादा किल्ला अस्तित्वात असावा असे
मला वाटते. तसे काही अवशेष येथे मिळत नाहीत हेही खरे पण प्राचीन काळापासून
अस्तित्वात असलेली पाच देखणी मंदिरे येथे आहेत. ह्या मंदिरांमुळेच
पेडगावचा इतिहास शिवकाळाच्याही आधी सुमारे चारशे ते पाचशे वर्षे मागे जातो
ते थेट यादवकाळात. ह्या जवळपास आठशे ते नऊशे वर्षे जुन्या असलेल्या ह्या
मंदिरांना भेट देण्यासाठीच भर उन्हात मी येथे दाखल झालोय
पेडगावला
येणे तसं जिकिरीचं काम. स्वतःच वाहन असल्याशिवाय येथे येण्यास पर्याय
नाही. पुणे- हडपसर -पाटस - दौंड आणि ह्यापुढे अजणूज मार्गाने पेडगाव गाठता
येतं. दौंड अजणूज मार्ग बराच खराब आहे. नगरवरुनही येथे श्रीगोंदे - पेडगाव
ह्या मर्गाने येता येतं.
बहादूरगड
तसा विस्तीर्ण पसरलेला भुईकोट. अगदी दूरवरुनही गडाच्या भक्कम भिंती दिसत
राहतात. गडाचं मुख्य प्रवेशद्वार अगदी पेडगाव संपता संपता आहे. द्वाराच्या
शेजारीच हनुमानाची दिड पुरुष उंच देखणी मूर्ती आहे.
कोटाच्या
वेशीतनं आत आल्याआल्याच सर्वात पहिलं लागतं ते ग्रामदैवत भैरवनाथाचं
मंदिर. हे ही मंदिर तसं बरंच जुनं. साधारण ८०० वर्षांपूर्वीचं. मंदिराला आज
आधुनिक साज चढवला आहे पण त्याचं मूळपण लपत नाही. मंदिराच्या आवारात असंख्य
स्तंभ, मूर्ती, मुखवटे, सतीशिळा विखुरलेल्या आहेत.

---
---
भैरवनाथ
मंदिर हे मूळचे शैव मंदिर असावे असे तिथल्या द्वारशाखांवरील शैव
प्रतिहारींमुळे सहजी लक्षात येते. अर्थात आजही ते शैव मंदिरच आहे. पण
मंदिरात आज जी भैरवनाथाची मूर्ती आहे ती मूळची विष्णू मूर्ती आहे.
मूर्तीभंजकांनी मूळचे शिवलिंग उद्ध्व्स्त केले असावे आणि नंतर स्थानिकांनी
येथीलच एका अप्रतिम विष्णूमंदिरातील मूर्ती येथे भैरव म्हणून स्थापित केली
असावी. शेंदराच्या जाड थराआड मूर्तीचे बाह्यरूप पूर्णतः लपून गेले आहेत.
तरीही तिच्या हातातली शंख, चक्र, गदा, पद्म ही विष्णूमूर्ती लक्षणं लपत
नाहीत.

---


भैरवनाथाचा
सभामंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. इथल्या स्तंभांवर भातवाहक यक्ष आहेत तर
स्तंभाच्या मध्यचौकडीतही भयानक चेहर्याचे यक्ष आहेत. इथली यक्षांची
चेहरेपट्टी पाहून मला हे शिल्पकाम तसं नंतरचं वाटतं. हे मंदिर यादवकालीन
आहेच ह्यात काहीच शंका नाही पण तरीही इथे नंतरच्या काळात काही संस्करणे
झाली असावीत असं मला वाटतं. कदाचित स्तंभमध्यांवर ही शिल्पे नंतरच्या काळात
कोरली गेली असावीत. एकूणातच मूळच्या शिल्पांवर झालेले रंगकाम, त्यांचे
चितारलेले डोळे ह्यांमुळे ही यक्षशिल्पे जास्तच विकृत आणि बटबटीत दिसतात.
---
---
---
सभामंडपाच्या
छतावर कमळाची अप्रतिम नक्षी आहे. जवळपास सर्वच मध्ययुगीन मंदिराच्या
छतांवर असे कोरीव काम नेहमीच दिसते. ह्या कमळाच्या सर्व बाजूने शिल्पपट
आहेत ह्यात विविध वादक, गंधर्व आदींच्या मूर्ती साकारल्या आहेत.

---
संभामंडपातच
एका स्तंभाच्या मध्यावर लज्जागौरीचं शिल्प कोरलेलं आहे. लज्जागौरी म्हणजे
मातृदेवता. स्त्रीच्या प्रजनन शक्तीचे प्रतिक. लज्जागौरी शिरोविहिन म्हणजे
शिराच्या जागी कमळाची आकृती आणि शिरासहही आढळते. शिरोविहिन मूर्ती खाली
दक्षिणेत आहेत. मी अद्याप तशी एकही मूर्ती प्रत्यक्ष पाहिली नाही. ह्या
मूती असभ्य समजून त्या भग्न केल्या गेलेल्या असाव्यात कदाचित ह्याचमुळे
ह्या मूर्ती बघायला मिळणे हे खूप दुर्लभ आहे. मी पाहिलेल्या दोन्ही मूर्ती
शिरसह आहेत. वेरुळच्या क्र. २१ च्या रामेश्वर लेण्यात लज्जागौरीची एक
अप्रतिम मूर्ती आहे. तशाच प्रकारची पण थोडीशी वेगळी मूर्ती पेडगावच्या ह्या
मंदिरातील स्तंभावर आहे. ह्या नग्न मूर्तीच्या दोन्ही हातात सर्प असून ते
तिच्या योनीतून निघालेले आहेत. सर्प हे पुरुष इद्रियाचे प्रतिक मानले जाते.

मंदिराच्या
आजूबाजूला झाडोर्यांत पूर्वीच्या देखण्या मंदिराचे कित्येक अवशेष आढळतात.
आज ते पूर्णपणे अनास्थेच्या गर्तेत आहेत. कधी ब्राह्मणी दिसते तर कधी
गजांतलक्ष्मी,

---

पेडगावच्या
बहादूरगडाचा हा संपूर्ण परिसरच आज ओसाड आहे. वेड्या बाभळीचं गच्च रान
माजलंय इथं. प्रत्येक पाऊल अगदी संभाळून टाकावं लागतं. विशेषतः भर
उन्हाळ्यात जसा आज मी येथे आहे हा परिसर पूर्णपणे उजाड, वैराण होतो.
जागोजागी खुरटी काटेरी झुडपी आहेत. चालण्यात जरा दुर्लक्ष झालं तर इथल्या
टोकदार काट्यांनी तुम्हाला ओरबाडलंच असं समजा. तरीही ह्या काट्याकुट्यांनी
भरलेल्या वाटेतच अजून दोन लहानशी पण अप्रतिम मंदिरे येथे आहेत. ती म्हणाजे
रामेश्वर आणि मल्लिकार्जुन. अर्थात नावात काय आहे, पण गावकरी ह्यां
मंदिरांना ह्याच नावाने ओळखतात. ही दोन्ही मंदिरे आज पूर्ण भग्नावस्थेत
आहेत तरीही त्यांचे देखणेपण आजही लपत नाही.
रामेश्वर
मंदिर म्हणजे मुखमंडपातील चार स्तंभ आणि छतावर केवळ दगडांचा डिगारा ह्याच
अवस्थेत दिसते. मंदिराची मूळची शैली कुठली काहीही अदमास घेता येत नाही.




पेडगावच्या
आख्ख्या कोटात मला केवळ एकच वीरगळ दिसला तो ह्या रामेश्वर मंदिराच्या
पुढ्यात. कदाचित पुष्कळ वीरगळ येथे असावेत पण बहादूरखानाच्या कारकिर्दित हे
सर्व नष्ट झाले असावे.

ह्याच्यानंतर
काट्याकुट्यातूनच चालत गेल्यास अजून एक मंदिर लागते ते म्हणजे
मल्लिकार्जुनाचे. ह्या मंदिराचा विस्तार मोठा आहे रामेश्चरासारखेच हे भग्न
मंदिर. येथेही छतावर मोठमोठे दगड रचलेले आहेत. ह्या मंदिराला त्रिदल गाभारा
असावा असे ह्याच्या बाह्य रचनेवरुन वाटते.



आता
मल्लिकार्जुन म्हणजे पार्वती आणि शिव. ह्या मंदिरात शिवलिंगही आहे. मात्र
मूळ मंदिर हे शिवपार्वतीचे नाही. हे मंदिर आहे विष्णूचे. आता हे ओळखायचे
कसे? तर ते तसं सोपं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस
शिरोभागी विदारण नरसिंहाच्या मूर्ती आहेत. विदारण नरसिंह म्हणजे आपल्या
मांडीवर हिरण्यकश्यपूला आडवा पाडून त्याचे पोट फाडणारा नरसिंह. नृशिंह
मूर्तींचे विविध प्रकार आहेत. स्थौण नृसिंह जो स्तंभातून प्रकट होऊन
उभ्यानेच हिरण्यकश्यपूशी लढत असतो, ल़क्ष्मी नृसिंह जो लक्ष्मीसहित असतो,
योगनरसिंह जो योगमुद्रेत असतो, केवल नरसिंह जो नुसताच बैठ्या अवस्थेत असतो.
ह्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे विदारण नृसिंह.


द्वारानजीक
महावीर आणि गणेशमूर्ती ठेवलेल्या आहेत. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार,
यादव ह्या सर्वच राजवटींचा जैन धर्माला देखील राजाश्रय होता. ह्या
राजवटींनी कित्येक जैन मंदिरे देखील बांधलेली आहेत. तसेच ह्यांच्या हिंदू
मंदिरांत देखील कित्येकदा महावीर, गोमटेश्चर, बाहुबली, पार्श्वनाथ अशा जैन
मूर्ती कोरलेल्या दिसतात.
ह्या मंदिरात
पाकोळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. जरा गाभार्यात पाऊल टाकावं तर
पाकोळ्या फडफडत उडून जातात. इकडे कुणीच येत नसल्याने हे त्या पक्षांचं
आश्रयस्थान बनल्यास त्यात नवल नाही.



ह्या
मंदिराच्या पुढेच मुघलकाळातील एक मोट बांधून काढलेली दिसते. आज ही सुद्धा
भग्नावस्थेत आहेत. विटांचं उंच बांधकाम, त्याच्या पुढ्यात मोटेचं काम आणि
खाली हौद अशी त्याची रचना.

ही
तीन मंदिरं पाहून आणि ह्या मोटेच्या पुढून सरळ चालत गेल्यावर इथलं सर्वात
मोठं आश्रय लागतं. एक नव्हे दोन अशी अत्यंत देखणी मंदिरे. त्यातलं सर्वात
प्रसिद्ध आहे ते इथलं लक्ष्मीनारायणाचं मंदिर. अतिशय सालंकृत. कोरीवकामानं
गच्च भरलेलं. निर्विवादपणे सुंदर असं.
त्याविषयी पुढील भागात.

क्रमशः
Primary tabs

पेडगावची तीन भग्न मंदिरं बघत बघतच आपण येतो ते इथल्या सर्वांगसुंदर मंदिरासमोर. ते म्हणजे इथले प्रसिद्ध असे लक्ष्मीनारायण मंदिर.
हे
मंदिर अप्रतिम अशा कोरीव कामामुळे नटलेलं आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह
अशी त्याची रचना. सभामंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. पैकी बाजूंची
दोन प्रवेशद्वारे अर्धमंडपातून उघडतात. म्हणजेच हे मंदिर मुखमंडप, सभामंडप
आणि अर्धमंडप अशा मंडपाच्या विविध प्रकारांनी युक्त आहे. ह्या मंदिराचं
सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की इथं अतिशय देखणी जालवातायनं आहेत जी समकालीन
मंदिरांत अगदी अभावानंच दिसतात. मंदिराच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी,
वादक, अष्टदिक्पाल, विष्णूचे २४ अवतार, गजथर, अश्वथर, नरथर, देवकोष्ठ असे
विविध प्रकार दिसतात.
पेडगावचं
मंदिर हे भीमेच्या काठावर. इकडच्या पाच मंदिरांच्या संकुलातलं सर्वात
मोठं, सर्वाधिक सालंकृत आणि सर्वाधिक देखणंं तसंच पुरातत्व खात्याकडून
सर्वाधिक निगा राखलं गेलेलं.

आजमितीस
ह्या मंदिराची बरीच पडझड झालेली आहे. मूळच्या कमालीच्या देखण्या असलेल्या
मंदिराच्या बाह्यभिंतींवरील मूर्ती आज बर्याचश्या झिजल्या आहेत. अर्धमंडप
आणि गर्भगृह यांची शिखरे आज पूर्णतः नष्ट झालेल्या अवस्थेत असल्याने
मंदिराचे शिखर पूर्वी कोणत्या पद्धतीचे असावे हे आजमितीस ओळखता येत नाही.
कोरीव
दरवाजातूनच मंदिरात प्रवेश होतो. मंदिरात रंगशिळेला चार स्तंभांनी आधार
दिलेला आहे, ह्याव्यतिरिक्त अंतर्भागात इतर स्तंभ नाहीत मात्र
जालवातायनाला, गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराला कोरीव अर्धसतंभांचा आकार देऊन
जास्त स्तंभ आहेत असा आभास निर्माण केलेला आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार

आतील
स्तंभांवर शैव, वैष्णव द्वारपाल, विविध पौराणिक प्रसंग, नर्तिका आदी
मूर्ती कोरलेल्या आहेत. स्तंभांना भारवाहक यक्षांनी आधार दिलेला आहे.
स्तंभांवरील कोरीव कामे
-
-
मंदिरातील
स्तंभाची रचना खाली तळखडा, त्यावर कुंभ, त्यावर चौकोनी उभट स्तंभ, त्यावर
अष्टकोनी स्तंभ, त्याच्यावर आमलकरुपी कलश त्यावर चौरंगासारखी नक्षी, त्यावर
उद्गम आणि सर्वात वर भारोत्तलन करणारे यक्ष अशी गुंतागुंतीची रचना आहे.

स्तंभांवर देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
शिव आणि भैरव
-
विष्णू आणि सूर्य
-
मुंगूस आणि धनाची पिशवी हाती घेतलेला कुबेर

कुस्ती खेळणारे क्रिडापटू

जैन साधू

गर्भगृहाचे
प्रवेशद्वार अतिशय सुंदर असून ते पंचशाख पद्धतीचे आहे. कल्पलता, स्तंभ,
पद्मलता, गंधर्व आणि व्याल त्यावर कोरलेले आहेत तर त्याच्या खालील बाजूस
गंगा, यमुना, चामरधारी द्वारपाल आणि किर्तीमुखे आहेत.
प्रवेशद्वार रचना

इस्लामी
आक्रमणात ही मंदिरे भग्न झालेली असल्याने येथील गाभार्यात मूर्ती नाही,
त्याऐवजी वीरगळाचा एक अर्धवट तुटलेला वरचा भाग येथे पीठाच्या स्थानी
ठेवलेला आहे.
अंतर्भागातील मंदिर रचना

इथली जालवातायने अतिशय देखणी आहेत हे आधी सांगितलेच आहे, मात्र त्यांचे खरे सौंदर्य दिसते ते आतील मंडपातूनच.
जालवातायन

विविध प्रकारचे नक्षीकाम असलेले जालवातायन

चला तर आता मंदिराच्या सभोवताली एक फेरफटका मारुयात
बाहेरील बाजूस मंदिर पंचरथ पद्धतीचे असून गजथर, अश्वथर, नरथर, जंघा आणि त्यावर देवकोष्ठ अशी रचना आहे.

एका वेगळ्या कोनातून मंदिर

बाहेरुन दिसणारे जालवातायन

गजथर व अश्वथर

मंदिराच्या
बाह्यांगावर विविध सुरसुंदरी, नर्तक, विष्णूचे अवतार, अष्टदिक्पाल यांच्या
सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. ह्यापैकी काही आता आपण बघू.
नृसिंहावताराची ही भग्न मूर्ती

त्रिशूळ आणि नाग हाती धारण केलेली ही भैरवमूर्ती

विष्णूचा वराह अवतार

भैरवाची अजून एक मूर्ती

एडका वाहन असलेली हाती जपमाळ, ध्वज, पाश आणि कमंडलू धारण केलेला हा आग्नेयेचा दिक्पाल अग्नी

ऐरावत वाहन असलेला वज्र धारण करणारा पूर्वेचा दिक्पाल इन्द्र

दोन कमळे हाती घेतलेला सूर्य

येथील सर्वात जास्त आवडलेली दिक्पाल मूर्ती म्हणजे वायव्येचा दिक्पाल असलेल्या वायूची.
दोन फडफडते ध्वज, खांद्यावर घडा, झेपावत असलेले वाहन हरीण ह्या सर्वांशी विलक्षण समतोल साधत असलेली त्रिभंग मुद्रेतील वायू.

आता सुरसुंदरींच्या मूर्ती बघू
एका सुंदरीच्या पायात अडककेला काटा काढण्याच्या प्रयत्नात असलेला बटू

आळस देणारी आलस्यसुंदरी

सुरसुंदरी
शुकसारिका- हिच्या डाव्या हातात असलेला पोपट आज पूर्णपणे नष्ट झालाय मात्र
हातातील फळांच्या घडामुळे हीची ओळख अगदी सहज पटतेय.

ही बहुधा दर्पणसुंदरी असावी

आता मंदिराच्या बाह्यभिंतींचे अवलोकन करु



मंदिराचे विलक्षण कोनातून होत असणारे दर्शन विलक्षण सुंदर भासते.

भीमेच्या ऐन तटावर हे मंदिर वसलेले आहे.


बाहेरुन दिसणारे जालवातायन


मंदिरासमोर असलेले भीमेचे विस्तीर्ण पात्र

लक्ष्मीनारायण
मंदिराच्या अगदी समोरच आहे ते अजून एक नितांतसुंदर पण भग्न झालेले
बाळेश्वर मंदिर, त्यासकट पाहूयात बहादूरगडाचे काही अवशेष पुढच्या भागात.
हे बघून फार तर 'एक बाई कुणाच्या तरी डोक्यावर पाय देतेय' याच्यापलिकडे आकलन नसतं झालं!
ह्या अशा प्रकारच्या मूर्ती अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे भग्न जरी असल्या तरी प्रसंग ओळखता येतो :)
कुठंय ध्वज? हरिण आणि त्रिभंग (काजोलच्या कृपेने) ओळखता आले.
खाली बाणाने वायूचे दोन्ही ध्वज दाखवले आहेत.

ऐरावत आणि वज्र आमच्या डोळ्यांना नाही दिसले.
ऐरावत हा पायाशी आहे. बाणाने त्याचा निर्देश केला आहे. डावीकडे वरच्या हातात धारण केलेय ते वज्र आहे तर उजवीकडे अंकुश आहे.

बाळेश्वर मंदिर
पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी पुढ्यातच आहे हे भग्न मंदिर,
ते आहे बाळेश्वराचं. आजमितीस ह्या मंदिराचे शिखर आणि सभामंडप संपूर्ण
उध्वस्त स्थितीत असून फत गर्भगृह शाबूत आहे. जरी हे मंदिर छोटेखानी आणि
भग्न असलं तरी दिसायला अत्यंत देखणं आहे. कदाचित भग्न असल्यामुळेच अधिक
देखणंही दिसत असावं असं मला वाटतं. हे मंदिर एका अधिष्ठानावर उभारले असून
सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी याची रचना आहे. मंदिराचे शिखर भग्न
झाल्यामुळे याची शैली कोणती ते आज कळत नसली तरी ते भूमिज मंदिर असावे असे
वाटते. सभामंडपाचे छत आज अस्तित्वात नाही आणि फक्त आतले स्तंभ आज कसनुसे
उभे आहेत.
बाळेश्वर मंदिर

सभामंडपातील स्तंभ निर्विवादपणे देखणे आहेत आणि त्यांवर विविध मूर्ती पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत.
स्तंभांवरील शिवतांडव आणि नृत्य करणारा गणेश
--
वाली-सुग्रीवाचे युद्ध, आणि बाजूला बाण सोडण्याच्या तयारीत असलेला राम

एका स्तंभावर योग नृसिंहाची मूर्ती दिसते.

येथील प्रत्येक स्तंभावर वेगवेगळ्या प्रकारची सुरेख नक्षी दिसते.
---
मंदिराचे अंतराळ एकूण दोन अर्धस्तंभांवर आणि दोन पूर्ण स्तंभांवर तोललेले असून त्यावरील कलाकुसर देखणी आहे.

अंतराळातून दिसत असलेले समोरचे लक्ष्मीनारायण मंदिर.

अंतराळात समोरासमोर दोन देवकोष्ठे आहेत पण त्यात मूर्ती नाहीत. येथील
सर्वाधिक देखणा जो भाग आहे तो येथले गर्भगृहाचे प्रवेशद्वार जे अतिशय
सालंकृत आहे. द्वारपट्टीकेवर गणेश असून नक्षीदार स्तंभाच्या भोवती चामरधारी
सेवक सेविका, द्वारपाल आणि मंदिराच्या बांधकामासाठी धन, पाणी वगैरे आणणारे
सेवक कोरले आहेत. द्वाराची पायरी सुद्धा नक्षीकामाने अलंकृत असून त्यातही
दोन्ही बाजूंनी किर्तीमुखे आहेत तर त्यांच्या बाजूस गजव्याघ्रादी शिल्पे
कोरलेली आहेत. हे मूळात शैव मंदिर असून येथे वैष्णव मूर्तीचे प्राबल्य
दिसते ते बहुधा समोरील भव्य लक्ष्मीनारायण मंदिरामुळे.
प्रवेशद्वारावरील गणेशपट्टीका

डाव्या बाजूवरील पाण्याचा हंडा घेऊन येणारे सेवक, चामरधारी द्वारपाल आणि सेविका

उजव्या बाजूवरील सेविका, द्वारपाल आणि धनाची पिशवी घेऊन येणारे सेवक.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची सालंकृत पायरी

गज व्याघ्रादी जोड्या
---
गर्भगृहात शिवलिंग असून अभिषेकाच्या पाण्यास शाळुंकेतून वाट करुन दिली
आहे. ह्या गाभार्यात दोन आश्चर्ये वसली असून ती आवर्जून पाहावी अशीच आहेत.
पैकी छतावर एक प्रमाणबद्ध किर्तीमुख आहे तर एका भिंतीत गुडघ्याचा आधार
घेऊन डोके टेकवून बसलेल्या एका वानराची अत्यंत सुरेख आकृती कोरलेली आहे.
शिवलिंग
छतात कोरलेले किर्तीमुख

वानराची अत्यंत देखणी मूर्ती

मंदिराच्या सभोवती फिरताना विविध देवकोष्ठे केलेली आढळून येतात. येथील
बाह्यभिंतीची पडझड झालेली असल्याने पुरातत्व खात्यातर्फे जीर्णोद्धाराचा
प्रयत्न सुरु असलेला दिसतो. व त्यांचे खडून कोरलेले क्रमांकही येथे टाकलेले
दिसून येतात.
बाह्यभिंतीवरील विविध मूर्ती व पुरातत्व खात्याने टाकलेले क्रमांक

गरुड आणि विदारण नृसिंह
----
ब्रह्मदेव

त्रिविक्रम विष्णू

मंदिराच्या बाह्यभिंती

कोसळते मंदिर

गेल्या ४/५ वर्षात पेडगावला जाणे झालेले नाही, आजमितीस हे मंदिर अजून
ढासळले असेल की ह्याचा अजून जीर्णोद्धार झाला असेल याची काहीच कल्पना नाही
पण आज ते ज्या अवस्थेत आहे त्यातही हे अतिशय सुंदर दिसते आहे हे निश्चित,
मग ते पूर्णपणे शाबूत असताना काय सुंदर दिसत असेल.
भीमेच्या तटावर असणारे मंदिर

पेडगावचा बहादूरगड अर्थत धर्मवीरगड
पेडगावचा बहादूरगड हा मोगलांचा सरदार बहादूरशहा कोकलताश याने बांधला असे
मानत असले तरी हा किल्ला निर्विवादपणे प्राचीन भुईकोट आहे. याची निर्मिती
यादवांनी केली आहे असे येथील जुन्या मंदिरांवरुन निश्चितच म्हणता येते.
मंदिरे सोडल्यास किल्ल्यात फारसे काही पाहण्यासारखे नाही मात्र हा किल्ला
एका दु़:खद घटनेचा साक्षीदार आहे. येथेच औंरंगजेबाने छत्रपती संभाजी
महाराजांना कैदेत ठेवले होते, येथेच त्यांची उंच विदुषकी टोपी काढून धिंड
काढण्यात आली होती व येथेच तापती सळई खुपसून त्यांचे डोळे काढण्यात आले
आहे. संभाजी राजांच्या त्या बलिदानाला स्मरुनच ह्या किल्ल्याचे नामकरण
अलीकडे धर्मवीरगड असे केले आहे.
ह्या किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी बहादूरखानाची
जेथे संभाजी राजांचे डोळे काढले असे मानतात ती जागा, येथे एक जुन्या मंदिराचा स्तंभ असून तो बाळेश्वर मंदिराचा असावा असे वाटते.

किल्ला बघायला जाताना रामेश्वर मंदिरापासून पुढे गेल्यावर बुरुजासारखे
बांधकाम असलेली एक मोट आहे, तिला हत्तीमोट असे म्हणतात. भीमानदीचे पाणी
मोटेखालच्या हौदात आणून ते वर उचलण्यासाठी मोटेवर एक दोरी अडकवण्यासाठी
हूकांसारखी रचना केलेली आढळते. येथूनच पआणी किल्ल्यात खेळवण्यात येई.
हत्तीमोट

हत्तीमोटेवरुन पुढे गेल्यावर प्रवेशद्वार येते. ह्याच्या बाजूलाच मशिदीचे पडके बांधकाम आहे.

प्रवेशद्वारातून आत आल्यावर उपरोल्लेखित संभाजी महाराजांचे हाल हाल जिथे
केले ते दृष्टीस पडते तर नदीकाठावर हमामखाना आणि काही उध्वस्त इमारतींचे
अवशेष दिसतात.
इमारतींचे भग्नावशेष

हमामखाना

एकात एक असलेल्या खोल्या

येथूनच झरोक्यातून खाली पाहता नदीकाठावर एक बुरुजवजा बांधकाम दिसते जे बहुधा नदीचे पाणी वर उचलण्यासाठी बांधलेली मोट असावी.

येथून भीमेचे विस्तीर्ण पात्र दिसते.

येथे आपल्या पेडगावच्या भटकंतीची इतिश्री होते. ही भटकंती मोठे मोठे
ब्रेक घेत लिहिली. मध्ये काही इतर विषयांवर लेख लिहित गेल्यामुळे पेडगाववर
लिहिणे मागे पडले होते. पण शेवटी लिहिणे पूर्ण झाले इतकेच.
धर्मवीरगड महादरवाजा...भैरवनाथ मंदिर...बालेकिल्ला प्रवेशद्वारअमानुषपणे उध्वस्त केल्या गेलेल्या शिल्प रचना..तोडफोडलेली रेखीव कलाकृतीदगड कोरीव खांब अवशेष त्या काळची भव्यता दर्शवतातप्रवेशद्वाराच्या डावीकडील बुरुजवरील शरब शिल्प...दीपस्तंभ आणि प्राचीन भग्न केलेली शिल्प... 
हमाम खाना... त्या वेळचे स्नान गृह
हमाम खाण्यातील आतील रचना

बाजूला असलेली भीमा नदी आणि उंचावर असणारा हा कारंजा रूपी पाण्याचा स्रोत... केवळ थक्क करणारे तंत्र

हमाम खान्यातील पायरी मार्ग...

स्नान
गृहातील पाणी वाहत जाऊन समोर दिसणाऱ्या नाली मार्गे वाहून जात... ही
संपूर्ण रचना किती सुबक पणे हाताळली आहे आणि गडाला सुशोभीत करण्यात हातभार
लावणारी आहे याचा प्रत्यत या ठिकाणी येतो.

पूर्वेकडील तटबंदी

भीमानदी तटाकडील बुरुज तटबंदी
भुईकोट असल्यामुळे गडाला बरीच बुरुज असून सद्या आपला शेवटचा घटिका मोजत आहेत.

हात्ती मोट...
सुंदर असं लक्ष्मी नारायण मंदिर...
एवढे आक्रमण होऊन...तोडफोड नासधूस होऊन ... आज कित्येक वर्षा नंतर सुद्धा आपल अस्तित्व टिकून उभी असणारी वास्तू.
बाळेश्वर देवस्थान

बाळेश्वर मंदिराबाहेरील गाभारा...

दगड कोरीव खांब शिळा.
अशा 10 -12 शिळा अगदी हुबेहूब कोरलेल्या अचंबित करतात
महाकाल बाळेश्वर गर्भगृह

लक्ष्मीनारायण मंदिर आणि बाळेश्वर मंदिर

भूमीच्या आत स्थित पाताळेश्वर महादेव

पाणदरवाजा...

समाथी अवशेष
बालेकिल्ला वरील हत्ती मोट
रामेश्वर मंदिर...
आज जे वास्तू रचना आपण पाहतोय यांच्या किती तरी पटीने ते भव्य होते याची कल्पना मंदिरा परिसरातील तोड फोड केलेले अवशेष देतात.

वीरगळ....
या वीरगळ अवशेषवर पूजा विधीचे क्षणचित्र कोरलेली दिसून येतात. त्या काळी
काही महत्वाचे आणि वीर योध्याचे लढाई मधील क्षण अश्या विरगळीवर कोरले जात.
दारू गोळा कोठार...

दारुगोळा कोठाराच्या आतील बाजूस...
उजव्या
बाजूला एक लहान गोलाकार छेद असून आत मधे भरलेली ज्वलनशील दारू आवश्यकते
नुसार काढली जात असे. डाव्या बाजूकडील जड गोळे ठेवण्याची जागा.
मल्लिकार्जुन मंदिर...
शिव पूजन स्थळ चित्र..

तीन गाभरे असणारे मल्लिकार्जुन मंदिर..
मल्लिकार्जुन महादेवस्थान https://www.facebook.com/Amrutbhavsar7
Bhadurgad AKA Dharmaveer gad
Marathwada Circuit- 1200 Kms, 7 forts, 2 Caves
Day 1: Pune-Madha-Paranda-Tuljapur (360 Kms)
Day 2: Dharshiv Caves
Day 3: Tuljapur-Ausa-Kharosa-Udgir-Nanded (280 Kms)
Day 4: Nanded-Kandhar-Dharur-Kunthaligiri (290 Kms)
Day 5: Kunthaligiri-Kharda-Bhadurgad AKA Dharmaveergad-Pune (265 Kms)
Type: Land Fort
Base Village: Pedgaon
Where: 130 Kms from Pune, 15/20 Kms from Shrigonda off Daund
Route: Kunthalgiri-Bhoom-Kharda-Jamkhed-Pedgaon
Time visited: August 2011
Time to see around: 4 hours
How to reach: It’s near Daund, off Daund-Nagar higway or can be easily reached from Shrigonda village.
My Meter reading from Pune: Pune 1190 Kms
History:
Bahadurgad , the major Mughal camp was said to have been built by
Bahadur Khan Kokaltash, the mughal viceroy to the Deccan. It has several
names including Bhadhurgad, pedgaon cha killa and Dharmaveer gad.
This historic fort is famous for two things-
Shivaji
Raje had heard the news of the arrival of the two hundred trained
arabian stallions at Bahadurgad He deliberately leaked the news that he
was planning to attack Bahadurgad. Intially 2000 men attacked the fort
and then chose to retreat with Bahadur Khan chasing with his full might.
Luring the mughals away from the fort by well over 20kms, the marathas
dissappeared in the thick woods. Meanwhile the remaining 7000 odd
maratha contingent attacked the fort, taking away all the gold and
horses. Sambhaji Raje along with his wife was also said to be imprisoned
here by Diler Khan when he fell out with Shivaji Mharaj. Later
after death of Shivaji, in 1689, When Sambhaji Raje was captured at
Sangameshwar, he was brought to Bahadurgad, as a prisoner. Sambhaji Raje
and Kavi Kalash were subjected to a horrific torture when they did not
accept to be converted to Islam. Bahadurgad has been renamed as
Dharmaveergad in the memory of Sambhaji raje.

Except
for a few monuments and broken down walls and bastions, theres nothing
left. As you enter through the arch there is welcoming board and next to
it is a shiv mandir.
Ruins of Jain thirthankars and other idols are kept nearyby.


Amongst
the several temples inside the fort, there are the Bhawani mata temple
(fortified by a stone wall), the Hanuman temple (with a large Hanuman
image in saffron), the Ganesha temple and some very old Yadavkaalin
temples (built in the Hemadpanthi style) including the Rameshwar temple,
the Mallikarjun temple, the Laxmi Narayan temple and the Baleshwar
temple.

Another temple.
There are some statues of Lord Ganesh and Jain Thirthankars found near by are kept in this Shiv temple..

Of
all these Hemadpanthi temples, the Laxmi Narayan temple is the best
preserved and is under the protection of the Archaeological Survey of
India.

A temple opposite to this is also worth dekko.

Please refer to the details page about these temples.

The Hatti-chi moat used to draw water is worth seeing.

The
terracotta pipes (holes in the pics) supplying water to palaces and
darbar is clearly seen at the structure where water used to be poured.
This is just on the left of Laxmi Narayan temple and in front is
'Hatta-chi moat'.

The 3 floor palaces with magnificent view of river below are now completely in ruins.

Several rooms had beautiful arches and 'zaroka' on the roof. One of the room was a sort of secret hiding room.

The
terracotta piping is clearly seen in bathrooms. It said that they had
tubs and there is small room for babies with baby tub. The water
markings are seen clearly.

This structure is seen below in the river. Not sure what is this but could haveen used as deck for fishing and other boats?

The
only structure now remains of the darbar are the main arch. There is a
pillar placed in the centre offering a tribute and depicting where
Shambhaji raje would have been made to stand when captured.

The fencing fortification wall is seen clearly on side of river.

This was Nal Dwar or gate probably used for fetching river water for localites.
With
emotional memories we preceded back home via Daund. On the way had
wonderful dinner at Kanchan dhaba, our regular spot on Solapur highway.
http://ekpravas.blogspot.com/2011/08/bhadurgad-aka-dharmaveer-gad.html
No comments:
Post a Comment