Tuesday, May 28, 2024

ओंकारेश्वर मंदिर , पुणे 52

पूर्वी 'ओंकारेश्वरी जाणं' ह्याला वेगळा अर्थ होता. पुण्यात पूवीं वेगवेगळ्या जातींच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी होत्या. पैकी श्री ओंकारेश्वर मंदिराशेजारी  नदीच्या बाजूस ब्राह्मणांची स्मशानभूमी होती. मग वाढत्या पुण्याच्या गरजा भागविण्यासाठी सर्वांना एकत्र अशा वैकुंठ स्मशानभूमीची निर्मिती झाली आणि ओकारेश्वर स्मशानभूमीच्या जागेतून 'कै महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुल बांधला गेला. पुण्यात मात्र त्या पुलाची ओळख बालगंधर्व पुल किया ओंकारेश्वर पुल अशीच पटते
    ओंकारेश्वर मंदीरापलीकडच्या मुठा नदीला पूर्वी पावसाळ्यात पूर येत असे. आता खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणं झाल्यानं हा पूर नियंत्रित झाला आहे पण पुराचं प्रमाण किती, याचा मापदंड म्हणजे ओंकारेश्वराच्या मंदिरात पाणी शिरून त्याला स्नान घडलं म्हणजे बराच मोठा पूर आला असे समजल जायचं. एवंच काय की, त्या इटुकल्या पुण्यात ओंकारेश्वराला बरंच महत्त्व असाव. तरीही हे मंदिर, त्याच्या आसपासच्या लक्षात घेण्याजोग्या गोष्टी या अजूनही शाबूत आहेत. पण अजूनही जितकं लक्ष इकडं वेधलं जायला हवं, तितक ते वेधलं गेलेलं नाही, ही गोष्ट तितकीच खरी.

 
 
 

इतिहास:

आॅक्टोबर १७३६ च्या पेशवे दफ्तरातील नोंदीनुसार “नवे सिवालय बांधावे”चिमाजी आप्पा पेशवे यांनी या ठिकाणी हे मंदिर बांधून घेतले. या वाटेने गायी पाण्याला जात असत, म्हणून ही जागा पवित्र मानण्यात येत असे व या जागी मंदिर बांधण्याचे सुनिश्चित झाले. आषाढ शुद्ध त्रयोदशी, १७३८ च्या नोंदीनुसार शिवलिंग प्रतिष्ठापना करण्यात आले.

... गाये उतारी नवे सिवालय बांधण्याचे ठरविले... राजश्री शिवरामभट चित्राव यास काम घ्यावयास सांगितले व त्याचा मुहूर्त केला...' ही पेशवे दप्तर खंड २२ पान ३३९ वरील नोंद या संदर्भात महत्त्वाची आहे. दि. २६ ऑक्टो १७३६. पहिले बाजीराव व चिमाजीअप्पा यांनी मुठेच्या तीरावर एकतरी भव्य शिवमंदिर असावे, या भावनेनं मंदिर उभारणीचा संकल्प सोडला असावा.
   पुण्यातील श्रीनारायणेश्वर अन् श्रीपुण्येश्वर ही प्राचीन शिवस्थानं भ्रष्ट होऊन तेथे शेखसल्ल्यांची उभारणी झाली होती. (या मूळ शिवमंदिरांची पुन्हा स्थापना करण्याची गोष्ट शिवकालात व पेशवाईतही कोणत्याच राज्यकर्त्यांच्या मनात का आली नाही, हा प्रश्न उरतोच.)
... बाण थोर, उत्तम लक्षणयुक्त नरमदेहून ब्राह्मणानं आणिला होता. त्यास पाचसातशे रुपये दिल्हे होते. सोळोखा (शाळुका) पार्थिव लिंगासारखी तांबड्या पाषाणाची नवी करून लिंगस्थापना केली. सदरहू सिवालय व अवघा खर्चवेच पेसवियांनी केला. परंतु वेदमूर्ती सिवरामभट चित्राव यांजकडून कामकाजाचे पारपत्ये करविले...' १८ जून १७३८, आषाढ शुद्ध १३, शके... रविवार रोजी तिसरे प्रहरी या मंदिरात बाणाची स्थापना झाली.
नर्मदेतील स्वयंभू बाण आणण्यात आला, आणणा-यास ५०० ते ६०० रूपये मानधन देण्यात आले अशी नोंद सापडते. त्या काळात सोन्याचा भाव १५ रूपये तोळा होता. बाकी आपण सूज्ञ.तांबड्या पाषाणाची पार्थिव लिंगासारखी साळूंखी बनवून घेतली व याची प्रतिष्ठापना करण्यात आली. पेशवे दफ्तरातील नोंदीनुसार कोठेही मंदिरासाठी आलेल्या खर्चाचा ताळेबंद सापडत नाही, हे आश्चर्य कारण पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या रोजनिशीतील सर्व खर्चाचे ताळेबंद पहायला मिळतात. या मंदिराच्या स्थापनेचा संपूर्ण खर्च हा चिमाजी आप्पा पेशवे यांनी खाजगी खर्चातून केला असे सांगतात.
पुण्यातील ब-याच पेशवेकालीन वास्तू या पेशव्यांनी खाजगीतील खर्चाने बांधल्या आहेत उदा. शनिवारवाडा, पर्वती
   दोन शिवमंदिरांच्या दरम्यान दहन झालं, तर कैलासवास घडतो म्हणून नदीच्या एका तीरावर श्रीवृद्धेश्वर अन् या तीरावर श्रीओंकारेश्वर यांच्यामध्ये पेशवेकालीन पुण्याचं स्मशान असणं स्वाभाविक वाटतं. त्याआधीचं स्मशान श्री नारायणेश्वरच्या अलीकडे दसपिंड्या महादेवासमोरच्या नदीकाठी होते.

मंदिराची रचना

काळ्या पाषाणात बांधलेले सुबक मंदिर आहे.इतर सर्व मंदिरांपेक्षा या मंदिराचा आराखडा, रचना अन् स्थापत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. एखादं देऊळ म्हटलं की, तिथलं कोरीव काम, नक्षीदार घाट, कलाकुसर यांची अपेक्षा असते. पण ओंकारेश्वर मंदिराचं सगळंच वेगळं. थोडंसं खोलवटीत असणारं हे मंदिर त्याच्या प्रवेशद्वारावरील विटांच्या नगारखान्यामुळे लक्ष वेधून घेतं. बाकी मंदिराची अवघीच बांधणी दगडी आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराच्या समोर अन् डाव्या-उजव्या हाताला प्रशस्त व बंदिस्त ओवऱ्या आहेत. जमिनीवर दगडी फरशी आहे. ऐन मंदिरासमोरच्या प्रांगणात आकर्षक स्थितीतील नंदीची स्थापना केली आहे.

 
 
 
 
 

 
 
 
 मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला नऊ कळस पहायला मिळतात. चौकोनी भागांवर अष्टकोन साधून केलेले ४ अर्धघुमट बांधले आहेत. याच घुमटांवर मध्यभागी एकच उंच कळस अन् भोवतीच्या अर्धघुमटांवर आठ बुटके कळस, अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना केलेली आढळते. त्या कळसांचं नवं रंगकाम लांबून तरी आकर्षक भासतं. चार बाजूंना, चार कोप-यांना आणि मधे एक असे नऊ कळस मंदिराला पहायला मिळतात. हे अशा बांधणीत दुर्मिळ मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करताना गणेशमूर्ती पहायला मिळते. मध्यकलशावर किर्तीमुख शिल्प पहायला मिळतं. तसंच वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती कोरलेल्या पहायला मिळतात.
 
 
 
मंदीरात भव्य शिवलिंग पहायला मिळते, या शिवलिंगातील बाण हा स्वयंभू नर्मद्या बाण आहे, साळूंखा ही तांबड्या पाषाणाची आहे, आणि बाण आणि साळूंखा यांच्या रंगाचा भेद आजही स्पष्टपणे जाणवून येतो.
 
 
 
मुख्य मंदिर तीन आडव्या व तीन उभ्या चौरसाकृती भागांनी बनलेलं आहे. मंदिराला प्रशस्त असा अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग पहायला मिळतो.मध्यभागात श्रीमहादेवाची स्थापना केलेला गाभारा आहे, तर उरलेल्या आठ चौरसांचा उपयोग प्रदक्षिणामार्ग म्हणून केलेला आहे. या मंदिराच्या मागील बाजूस १८३० मध्ये प्रशस्त घाट बांधला गेला. त्याच्याच पुढे चौदा पायऱ्यांचा आणि मोठा चौथरा असलेला आणखी एक घाट बांधला होता. त्यातील जिवंत पाण्याचा झरा, तीन कुंडं हे सारं पानशेतच्या प्रलयात नष्ट झालं. देवस्थानची विस्तृत बाग अन् संरक्षक भिंतीही १९६१ च्या अस्मानी-सुलतानी आपत्तीत लयाला गेली.मंदिरासमोर एक देखणी दीपमाळ होती. तीही ढासळली. अगदी अलीकडे म्हणजे १९९३ मध्ये त्याच दीपमाळेचे चिरे वापरून ही दीपमाळ उभारण्यात आली. पौर्णिमेला हा सारा परिसर दिव्यांच्या अन् त्रिपुराच्या प्रकाशात न्हाऊन निघत असे.

मंदिराच्या समोर भव्य नंदी हे या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य. १९६१ च्या पानशेत धरण फुटल्यामुळे आलेल्या महापुरात हा नंदी उखडून पडला होता. महत्प्रयासाने तो पुन्हा बसवण्यात आला

१२ जुलै १९६२ च्या पानशेत धरण पूरानंतर वाताहात झालेले ओंकारेश्वर मंदिर

मंदिर परिसरात असलेली इतर मंदिरे आणि बांधकामे

१. चिमाजी आप्पा पेशवे यांची समाधी : १७३८ ला मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि १७ डिसेंबर १७४० ला चिमाजी आप्पा यांचा मृत्यू झाला, त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा बाई या सती गेल्या होत्या.   मंदीराच्या समोरच्या भागात वसईवीर चिमाजी अप्पा पेशवे यांच्या पत्नी सकळ सौभाग्य संपन्न अन्नपूर्णाबाईसाहेब पेशवे सती गेल्या, त्यांचं वृंदावन आहे. अष्टकोनी आकाराच्या या सती स्मारकाचं पानशेतच्या पुरात खूप नुकसान झालं आणि त्याची पुनर्बाधणीही नंतर झाली. पेशवे घराण्यात सती जाणार्या या पहिल्या असल्याची नोंद इतिहासाने केली. या ठिकाणी एक शिवलिंग व सालंकृत नंदीही आहे. १७ डिसेंबर १७३१ रोजी वसई युद्ध विजेत्या चिमाजीच निधन झालं. त्यांचं हे स्मरणस्थळ ओंकारेश्वराच्या पुढ्यात आहे, याची जागांवर बहुसंख्य लोकांना नाही. सतीस्मारकासमोरच एक अष्टभुजा देवीचं जागृत स्थान आहे. त्या देवीच्या अंबाड्यात महादेवाची पिंडी आहे.

 
 
 
    पूर्वी ओंकारेश्वर मंदिरासमोर एक श्रीविष्णू मंदिर होतं. तेही पानशेतच्या पुरात ढासळलं. ह्या मंदिराची उभारणी ओंकारेश्वरासमोर नगारखान्याबाहेर त्या थोड्याशा जागेत एका चौथऱ्यावर केली गेली. कमळकलिकेच्या आकाराचे हे काम आकर्षक असलं, तरी सध्याच्या जागी फारच बेढब वाटतं.
 ओंकारेश्वर मंदिर परिसरात चिमाजी आप्पा यांची समाधी पहायला मिळते. पूर्वी या ठिकाणी वृंदावन होत्या समाधीचा जिर्णोद्धार १८६१ मधे झाला आणि १९३० नंतर या ठिकाणी आता पहायला मिळते ती छत्री बसवण्यात आली.

 ओंकारेश्वराच्या संदर्भात आणखी दोन नोंदी महत्त्वाच्या आहेत. सवाई माधवराव पेशव्यांची द्वितीय पत्नी यशोदाबाईसाहेब रायगडावर इंग्रजांच्या कैदेत मृत्यू पावल्या. त्यांची दहनक्रिया रायगडावरच करण्यात आली, पण अस्थी ओंकारेश्वरानजीक पुरण्यात आल्या. विजयदुर्गच्या गोखल्यांची ही मुलगों को सर्वशक्तिमान पेशव्यांची पत्नी होती, तरी फारच दुर्दैवी ठरली. पुढे याच यशोदाबाईंची एक तोतयाही निघाली होती.
   रघुनाथराव पेशव्यांचा धाकटा मुलगा चिमणाजी (जन्म ३० मार्च १७८४ बेट कोपरगाव येथे) यांना सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई यांच्या मांडीवर दत्तक दिलं गेलं. हा दिवस होता १६ मे १७९६ म्हणजे वैशाख शुध्द दशमी शके १७१८. चिमणाजी माधवराव पेशवे यांना साताऱ्याहून आलेली पेशवाईची वस्त्रं २६ मे १७९६ म्हणजे वैशाख शुद्ध चतुर्थी शके १७१८ रोज येत मिळाली. खरं तर यशोदाबाईंचे चिमणाजी हे नात्यानं चुलत चुलत सासरे.तेव्हा हे सर्व दत्तकविधान प्रकरण शास्त्रसंमत होणं जड होतं. पण त्या वेळच्या राजकारणाला ते सोयीचं होतं म्हणून झालं. यांच्या पत्नी सीताबाई रोजच्या रिवाजाप्र‌माणे ओंकारेश्वराच्या देवळात वाती लावण्यासाठी सायंकाळी गेल्या असताना, तुपानं बरबटलेलं ताम्हण हातातून निसटून अंगावर पडलं व पेटत्या निरांजनानं लुगडं पेटून त्याच दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारी सन १८०९ रोजी रविवारी त्यांचं निधन झालं (फाल्गुन शुद्ध ११, शके १७३०), सीताबाई ह्या मोरोपंत अप्पाजी दामले यांची कन्या.
  ओंकारेश्वर दहनभूमी परिसरातच नदीच्या पात्रात पुण्यातील नामांकित धन्वंतरी वैद्य अण्णासाहेब पटवर्धन यांचं स्मारक आहे. त्यांचं दहन त्या जागी झालं ओंकारेश्वरी दहन झालेल्या सर्वच नामांकितांची यादी मोठी होईल. परंतु ओंकारेश्वर मंदिर अन् ओंकारेश्वर दहनभूमी यांना जुन्या पुण्यात फारच महत्त्व होतं.
 
 
सपिंड्या मारूती मंदिर : या मंदिरात पूर्वी पिंडदान होत असे.
 

 

 


 काळबुवा महाराज समाधी : हे एक सिद्धपुरूष होते, नाव विष्णूबुवा नारायण. ते सतत काळ आला काळ आला असं म्हणत म्हणून त्यांना लोक काळबुवा म्हणत.
महिषासुरमर्दिनी मंदिर

महिषासुरमर्दिनी मंदिर : हिरव्या पाषाणातली मूर्ती पहायला मिळते, देवीच्या मधल्या हातात असणारे त्रिशूल या मूर्तीच्या हातात दिसत नाही

दीपमाळ
नगारखाना
 
 

 दरभ्या मारूती मंदिर : पानशेत पुरात ही मूर्ती वाहून गेली असली तरीही मंदिराचे भग्न अवशेष पहायला मिळतात

पेशवाई पुण्यात येऊन जर या मंदिराला भेट नाही दिली तर पुणे प्रवास हा अपूर्ण राहिला असंच म्हणावं लागेल
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) अभिजित राजाध्यक्ष यांचे लिखाण
३)  इये महाराष्ट्रा देशी -प्र.के.घाणेकर
४)  https://aaishaasma.wordpress.com/ - आयशा आस्मा

संजय मोरे सह्यसखा व सह अभ्यासक

संकलक
आयशा आस्मा
रणरागिणी बा रायगड

९६१९९७१४९५

Omkareshwar Temple, Pune : A Photo Feature



Omkareshwar temple is situated near Balgandharva Rang Mandir, Shanivar Peth. The temple premises extend into a paved ghat descending into the river Mutha.
Omkareshwar till 1971 used to be the smashaan bhoomi (funeral site) for the Pune Hindus . It still continues to be the place where people perform the last obsequies for their departed kins.


Omkareshwar Mandir is a 18th century temple (1736-1738) constructed by one Shivram Bhat, the spiritual teacher of the Peshwa family / Krishnaji Pant Chitrav with donations from Chimaji appa, the commander of the maratha forces and the brother of Peshwa Bajirao I.


The Omkareshwar mandir has been built on a strong foundation and has withstood the Panshet deluge in 1962.



Pic:circumambulatory

Omkareshwar is one of the names of Lord Shiva and the temple has been dedicated to his consort Godess Parvati.


Omkareshwar Mandir has a Nagara styled Shikara made from soft white soap stone, with five layers, each having engravings and of sculptures of Gods and deities e.g a Ganesha with a unique straight trunk, a Dattaguru with the central face sporting a unique moustache, 'Makardhwaj' a composite figure of a serpent duelling a animal, a Vyasa and a parrot figurine,four 'Keerti mukhas' etc.


Besides the main Kalasa (spires), there are eight smaller kalasas with inner hollow semi hemispheres. Each spire is designed uniquely.

On entering the temple premises through a huge gateway, one first lays their eyes upn a mandir of Nandimaharaj.It houses a huge statue of Nandi, besides, statues of other deities encompassed on its walls.


It is said that , during the Panshet deluge, this Nandi idol was carried away to a distance by the flooding waters. The locals then pulled back this heavy nandi idol with great effort and replaced it on its original location.


The Nandi mandap is constructed ( reconstructed in 1993) in an large and open courtyard. The courtyard itself is surrounded by a structure that includes the ‘garbhagriha’ (sanctum sanctorum) which is further adjoined to various rooms, which seem to be inhabited by the temple authorities.


Between the main Garbhagriha and the Nandi temple is a Agnikunda or the place for the ceremonial fire.
Inside the garbhagriha is a beautifull Shiva Linga representing the union of Lod Shiva and Godess Parvati. The Shiva linga has a Shiva image with fish shaped earrings.


The Shiva linga is divided into a 'Shalunka', the base and the linga is called the 'baana'. Records in the Peshwa daftar state that this Baana was brought forth from Narmada river for a sum of Rs 700/-.


The outer walls of the temple are made from black stone. The temple also houses minor temples belonging to Bhawani, Vishnu, Hanuman, Ganesha, Shani etc.



During the national freedom movement many revolutionaries and political leaders like Tilak,Savarkar used to congregate in the vicinity of the Omkareshwar temple at a spot called the 'Taalim'. In 1906 when the firebrand revolutioary Veer Savarkar decided to light a bon fire of British goods, he and his followers had assembled in the Omkareshwar temple taalim.



The Omkareshwar temple premises also house another Shivalaya (abode of Shiva) by the name of Amruteshwarmandir. Its as old as Omkareshwar and is in its direct neighbourhood.

Pic: Samadhi sthal of Annapurnadevi, wife of Chimajiappa

The Omkareshwar mandir is a part of Pune legacy and heritage and a must see for the tourists.



Text and Photos: Abhijit Rajadhyaksha




No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...