हजार
वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना) या गावात आहे.
एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा, गर्भगृह, मुखमंडप व 20
कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत बाभळी व काटेरी झुडूपे
वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली घामवती नदी सहसा कोरडीच
असायची. गावकर्यांनी या परिसराची स्वच्छता व मंदिराची दुरूस्ती करण्याचे
मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल
करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण
परिसराला आल्हाददायक बनविते. छत्रपती संभाजीनगरपासून अग्रेय दिशेला पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर जामखेड
गाव आहे. गावाजवळ असलेल्या जांबुवंत लेण्या वरून या गावाचे नाव जामखेड
पडले आहे. त्याचे पूर्वीचे नाव 'जंबूखेड' असे होते. नंतर हे स्थळ 'जामखेड'
असे आहे.
जामखेडचे हे मंदिर 'खडकेश्वर महादेव' मंदिर म्हणून ओळखले
जाते. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. जामखेड गावाबाबत ग्रामस्थांकडून एक
अख्यायिका सांगितली जाते. रामायण काळामध्ये जांबुवंत आणि हनुमानाची लढाई
याच गावात झाली असल्याचे सांगतात. गावाजवळच असलेल्या एका टेकडीवर
जाबुवंताचे मंदिर आहे. हे मंदिर डोंगरकपारीत कोरलेली एक गुहा आहे. प्रस्तुत
गुहा पाहतांना इथे लेणी कोरण्याचा प्रयत्र झाला असावा. परंतु दगडांमध्ये
ठिसूळपणा अधिक असल्यामुळे सदरील काम अर्धवट सोडण्यात आले असावे. हीच जागा
ग्रामस्थ जांबुवंत मंदिर म्हणून दाखवतात. महाराष्ट्रातील शहरापासून
खेड्यापाड्यापर्यंत मारुतीचे मंदिर पहावयास मिळते. परंतु जामखेड च्या
परिसरात मारुतीचे मंदिर कुठेही आढळून येत नाही. ही या परिसरातील विशेष
उल्लेखनीय बाब आहे असे म्हणावे लागेल. जाबुवंत आणि हनुमानाच्या लढाईत
जावुवंताचा घाम इथे ठिबकला असल्याने या नदीस घामवती नावाने ओळखली जाते. याच
घामवती नदीच्या काठावर खडकेश्वर महादेवाचे हे प्राचीन मंदिर उभे आहे. या
गावात नदीला पाणी आले असे म्हणत नाहीत. तर घाम आला असे म्हणतात.

जामखेडच्या
खडकेश्वर मंदिराचे स्थापत्य पाहता उत्तर चालुक्यकालीन आणि पूर्व यादवकालीन
राजवटीचा प्रभाव मंदिरावर स्पष्ट जाणवतो. मंदिराच्या बाहेर स्वतंत्र
नंदीमंडप असून तो यादव काळात निर्माण केलेला आहे. मराठवाड्यात अकराव्या
शतकांतील आठ मंदिरे नोंदवल्या गेली आहेत. खडकेश्वराचे मंदिर हे त्यातीलच
एक. मूळचे मंदिर भक्कम उंच चौथर्यावर बांधल्या गेले असावे. आज हा चौथरा
मातीत बुजला असून जमिन सपाटीवर आता मंदिराचा मुखमंडप आलेला आहे. खडकेश्वर
मंदिर-पीठ इतर चालुक्यकालीन मंदिराप्रमाणेच असावे. परंतु सध्या
ग्रामस्थांनी केलेल्या विविध कामांतर्गत हे पीठ पूर्णपणे जमिनीत गाडले गेले
आहे.
हजार वर्षांचे एक प्राचीन शिवमंदिर जामखेड (ता. अंबड जि. जालना)
या गावात आहे. एकेकाळी बाहेरून पूर्णत: ढासळलेले हे मंदिर गाभारा,
गर्भगृह, मुखमंडप व २० कोरीव खांब असे संपूर्ण सुरक्षीत होते. परिसरांत
बाभळी व काटेरी झुडूपे वाढली होती. मंदिराला अर्धचंद्राकार वेढा घातलेली
घामवती नदी सहसा कोरडीच असायची. गावकर्यांनी या परिसराची स्वच्छता व
मंदिराची दुरूस्ती करण्याचे मनावर घेतले. आज हे मंदिर अतिशय चांगल्या
अवस्थेत उभे आहे. सर्व परिसर समतल करण्यात आला आहे. मंदिरासमोर पिंपळाचे
मोठे झाड आहे. त्याची सावली संपूर्ण परिसराला आल्हाददायक बनविते.
मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. आज जे मंदिर उभे आहे त्याचा आकार ४२ फूट x ३१ फूट असा आहे. मंदिराच्या विताना प्रमाणे एक गर्भगृह असलेले हे मंदिर होय. मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पकाम असावे असा अंदाज आहे. कारण मुखमंडपाच्या बाहेरच्या भागातील काही शिल्पे आजही चांगल्या अवस्थेत दिसून येतात. बाहेरचा भाग संपूर्णच ढासळलेला होता. तेंव्हा तो घडीव दगडांनी लिंपून घेत बाह्य भिंत उभारल्या गेली आहे. तेंव्हा आता इथे एकही शिल्प दिसत नाही. मात्र मंडपाच्या दक्षिण भिंतीला आणि उत्तर भिंतीला अपूर्ण अशी दोन देवकोष्ठे आहेत. डॉक्टर प्रभाकर देवांच्या मते, 'त्रिदल पद्धतीच्या मंदिराची सुरुवात येथे दिसते. मंदिराला मुख्य गर्भगृह आणि दोन उपगृहे वाटाव्यात अशा रचना आढळून येतात. डॉ. प्रभाकर देव यांनी आपल्या पुस्तकांत असे नोंदवले आहे की ११ व्या शतकांतील मंदिर शैली विकसित पावून १२ व्या शतकांत त्रिदल पद्धतीची मंदिरे मराठवाड्यात उभारल्या जावू लागली. हा जो मंदिर शैलीचा सांधा आहे त्याचा पुरावा या जामखेडच्या मंदिरात आढळून येतो. एकल गर्भगृह असलेले अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) आणि त्रिदल पद्धतीतील आता उद्ध्वस्त असलेले केसापुरी (ता. माजलगांव, जि. बीड) या दोन मदिरांच्या अंतराच्या दृष्टीने अगदी मध्ये खडकेश्वर महादेव मंदिर आहे. आणि नेमके शैलीच्या दृष्टीनेही हे मंदिर मध्यभागी आहे. हा एक विलक्षण योगायोग आहे.
मंदिराच्या सभोवताली अर्धचंद्राकार वेढलेली 'घामवती' नदी मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर घालते. आज हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत दिसत असले तरी, ग्रामस्थांनी केलेले नूतनीकरण मंदिराच्या बाह्यभागावर असलेल्या शिल्पकलेला बाधक ठरले आहे. कारण मुळ मंदिराच्या बाह्य भागावर कोरलेली शिल्प आज नूतनीकरणा मुळे अस्तित्वात राहिली नाहीत. मंदिराच्या बाह्यभागावर शिल्पकला होती का नव्हती हे ही कळण्यास आज कोणताही मार्ग उपलब्ध नाही. मंदिराचे शिखर विटांनी बांधलेले होते.
मुखमंडपाला चार देखणे कोरीव अर्धस्तंभ आहेत. हे स्तंभ चार फुट भिंतीवर उभारलेले असून त्यांनी छत तोलून धरले आहे. मंडपाला आठ कोरीव स्तंभ असून अष्टकोनी रंगपीठावर हा मंडप उभा आहे. या स्तंभांवर सुंदर असे कोरीव शिल्पकाम केले आहे. हत्तीवर बसून लढणार्या स्त्रीयोद्धा, शेषशायी विष्णू, नृत्यांगना अगदी हनुमान व जांबुवंत यांच्या लढाईचे पण शिल्प या स्तंभांवर कोरलेले आहे. मंदिराला एकूण २० नक्षीदार स्तंभ आहेत.
मंदिर आणि मूर्ती शास्त्राचे अभ्यासक असलेल्या पूर्वसुरींच्या लेखनात काम विकार बाहेर ठेवून मंदिरात प्रवेश करावा; हा सिद्धांत चुकीचा असून काम हे मानवी जीवनाचे एक प्रमुख अंग आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी तंत्रशास्त्राच्या प्रभावातून काम शिल्पे कोरली गेली. ते 'विकार' नसून 'संस्कार' याचाच एक भाग होता. सभामंडपाला आठ कोरीव स्तंभ असून रंगशिळा ही अष्टकोनी आहे. रंगमंडपः मंडपाच्या मध्यावर अष्टकोनी रंगमंडप आहे. रंगमंडपाच्या आठ गुणांवर आठ कोरीव स्तंभ उभे आहेत. यातील काही स्तंभांवर कामशिल्प कोरलेली आढळून येतात.
स्तंभ क्रमांक एकः-
रंग शिळेच्या स्तंभ क्रमांक एक च्या तळ भागावर ६ × ८ इंच आकाराचे उत्तान लिंग हाती घेतलेले पुरुषाचे शिल्प आहे. उत्तान लिंग देवतेला दाखविणे हा तांत्रिक पूजेचा भाग आहे. या मध्ये वीर्य देवतेला अर्पण केले जाते. उत्तेजित लिंगाचे चाळे किंवा हालचाल करून पूजन केले जाते. याच स्तंभावरील उत्तर दिशेस एक प्रसव शिल्प १० x ८ इंच आकाराचे कोरलेले असून त्यात रखीने हात जोडून बाळाला जन्म देत असताना शिल्पांकित केले आहे. हे शिल्प पूर्णतः सृजनशी नाते सांगणारे शिल्प असून कदाचित असे दोन्ही हात जोडून नमस्कार मुद्रेत कोरलेले एकमेव 'प्रसव' शिल्प असावे.
स्तंभ क्रमांक चारः-
रंगशिळेवर असलेल्या एकूण आठ स्तंभापैकी प्रदक्षिणा क्रमाने चौथ्या स्तंभावर पूर्वमुखी स्तंभ-मध्यावर एक कामशिल्प कोरलेले आहे. हे कामशिल्प १५ इंच × ६ इंच कोरलेले असून, याच स्तंभाच्या खाली एक प्रसव शिल्प ८.६ इंच × ६.६ इंच कोरलेले आहे. प्रस्तुत कामशिल्प काम शास्त्रीय ग्रंथानुसार, रतिमार्ग आसन या नावाने ओळखले जाते. या आसनात उताणी झोपलेल्या स्वीवर पडून तिचे दोन्ही स्तन हाताने मर्दन करीत समागम केल्यास तो 'रतिमार्ग बंध' होय असे म्हटले जाते. (२) इतर काही आचार्यानी यास रतिपाश आसन असेही म्हटले आहे. श्रीच्या दोन्ही जांघेत घुसून अतिगाढ अलिंगन देत समागम करीत असल्यास त्या रतिक्रिडेला 'केयूर' आसन म्हणतात. (१) यास श्री कल्याणमल्ल हे 'सौम्य' नामक आसन असे म्हणतात. (१०) समागम करणारा पुरुष श्रीच्या वर उचललेल्या दोन्ही मांड्या एकमेकांना भिडवून समागम करीत असल्यास त्यास 'गगनक' आसन म्हणतात. (११) प्रस्तुत शिल्पाचा आकार खूप लहान असल्याने स्त्रीच्या मांड्या एकमेकांना भिडवून आहेत का हे स्पष्ट दिसत नाही. या समागम शिल्पाच्या बाजूला एक पुरुष बसलेला असून त्याने आपली मान तिरकी वळवलेली आहे. जणू काही तो इशारा करीत असावा. तंत्र शास्त्रात गुरु तांत्रिक समागम शिकवत असल्याने हे शिल्प तंत्र शाखानुसार तयार केलेले आहे. समागम करीत असलेली व्यक्ती ही कुणीतरी महत्वपूर्ण व्यक्ती असावी. कारण त्यांच्या शेजारी बसलेले तांत्रिक गुरु हे यांचा समागम पहात नाहीत. तसेच तांत्रिक गुरु हे गुढग्यावर बसलेले असून साधनेच्या आवर्तनात आहेत. गुढग्या जवळ एक कमंडलू दाखविलेला आहे. हा साधू कापालिक साधू नसावा कारण त्याच्या जवळ दंड, रुद्राक्ष, कडा असे काही दिसत नाही. तर हा साधू यादव काळातील असावा असे वाटते. तसेच प्रस्तुत समागम शिल्पातील गतिमानता किंवा वीर्य निष्काशित करण्याचा अवधी समीप आला असल्याचे दाखविण्यासाठी पुरुषाचे वृषण हवेत दाखवलेली आहेत. याच स्तंभावर गर्भगृहा कडे मुख करून असलेले 'प्रसव' शिल्प कोरलेले आहे.
स्तंभ क्रमांक सहाः- १५ इंच × ६.६ इंच आकाराचे रंग शिळे वरील प्रदक्षिणा क्रमाने स्तंभ क्रमांक ६ च्या मध्य भागावर तीन भागात शिल्पांकन केलेले आढळून येते. पहिल्या भागात आपले दोन्ही हात वर घेऊन आळस देत असलेली अलस कन्या कोरण्यात आलेली आहे. ही अलस कन्या नग्र दाखवण्यात आली आहे. शिल्पाच्या दुसऱ्या भागात उत्तेजित लिंग हाती घेतलेले शिल्प असून ते तांत्रिक विधीचे संकेत देतात. तिसन्या भागात रती पूर्व क्रीडा करीत असलेले युगल कोरलेली आहेत. रवी ही समागमाच्या बाबतीत निसर्गतःच लांब असते. तिला फुलवण्यासाठी, रुंजी घालण्यासाठी जे प्रयोग केले जातात त्यास काम शास्त्रज्ञांनी 'वाह्यरत' असे नाव दिलेले आहे. बाह्यरत मिलनाचा आनंद देणारे अद्भुत रहस्य आहे. या रहस्याची उकल आलिंगन, चुंबन, नख क्षन व दंत क्षत या क्रियातून होते. स्त्रियांच्या काम व्यवहारासंबंधी रिचर्ड म्हणतात, "This is all the more important in view of the widely held traditional Indian belief that a woman has greater need of sexual satisfaction than a man." (१२) प्रस्तुत शिल्प आलिंगन आणि स्तन मर्दन करीत असतानाची असून आलिंगन म्हणजे भेट एवढाच अर्थ आपण घेतो पण काम शास्त्रज्ञांनी यातही अनेक भेद दिलेले असून प्रत्येक आलिंगन जे वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या रुपाने स्पष्ट झालेले आहे. आलिंगन या बाह्यरती चे दोन प्रकार आहेत.
१. दर्शन २. स्पर्शन
एकमेकाकडे पाहिल्याने उत्पन्न होणाऱ्या प्रेमाला 'दर्शन रती' व एकमेकास स्पर्श करून उत्पन्न होणाऱ्या प्रेमाला 'स्पर्शन रती' म्हणतात.
स्तंभ क्रमांक सातः-
रंग शिळे वरील स्तंभ क्रमांक सात ज्याच्या उत्तर दिशेस एक तांत्रिक विधीचे शिल्प कोरण्यात आलेले आहे. प्रस्तुत शिल्पाचा आकार १५ इंच ६ इंच आहे. या शिल्पांमध्ये पाठीवर कमंडलू घेतलेला एक तांत्रिक योगी असून तो काहीतरी सूचना देत आहे. ह्या तांत्रिक साधूची मूर्ती एखाद्या रामदासी प्रमाणे दिसते. लांब केस आणि पाठीवर कमंडलू आहे. शिल्प मध्यात एक स्त्री आहे. जिने आपल्या पाठीमागे उभ्या असलेल्या पुरुषाचे उत्थित लिंग हाती धरलेले आहे. तर त्या पुरुषाच्या पाठीमागे एक खी उभी असावी असे वाटते. गर्भगृहाच्या डाव्या कोपर्यात देव कोष्टकाच्या बाजूस 7 इंच × 6 इंच आकाराचे एका स्तंभावर चुंबन घेत असलेल्या स्त्री-पुरुषाचे शिल्प असून समोर एक तांत्रिक योगी हात जोडून प्रार्थना करीत असताना दिसत आहे. त्याच्यासमोर एक कुंभ ठेवलेला दिसतो. प्रस्तुत शिल्पातील स्त्री-पुरुष थोडीसे मान वळवून ओठांचा चंबू करून एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेत असतील यास कामसूत्रात 'तिर्यक चुंबन' असे म्हटले आहे. ५०० या शिल्पात स्त्रीने साधूचे केस हाती धरलेले आहेत. तांत्रिक विधी मध्ये केस चमत्कारिक शक्तीचे प्रतिक मानले जाते. तांत्रिक ग्रंथ 'कर्पूरदृष्ट्यम' यात केस आणि मैथुन यांचा महसंबंध स्पष्ट करण्यात आला आहे. यानुसार 'विरसाधना' या विधीत स्मशानात रात्री 'वीर्य' व 'केस' देवतेला अर्पण केल्यास सर्व लौकिक सुखाची प्राप्ती होते. असे सांगितले आहे. काक्षासनाच्या खालील भागावर देखील हातात उत्तेजित लिंग घेऊन उभे असलेले साधक कोरलेले दिसून येतात. ज्यांचा तांत्रिक पुजेशी असलेला महसंबंध दाखविण्यात आला आहे.
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर यांच्या वतीने देण्यात येणारा पहिला सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर म्मृती पुरस्कार वितरण प्रसंगी मूर्तीशाखाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी, "गोपुरांवरच्या स्त्री प्रतिमा 'Fertility Goddess' नाहीत." असे प्रतिपादन केले आहे. या प्रसंगी बोलताना डॉ गो. बं. देगलूरकर म्हणतात, "प्रदक्षिणा घालत असताना काम, क्रोध, मद आदींचा त्याग करण्यासाठी ती योजना असते. असे असेल तर, मंदिराच्या रंगशिळा स्तंभावर काम शिल्प कोरली गेलीच नसती.
सारांश रूपाने असे म्हणता येईल की,
१. मंदिर हे केवळ धार्मिक केंद्र नसून ते तांत्रिक विधीच्या माध्यमाने लैंगिक शिक्षण देणारे केंद्र होते.
२. मंदिराच्या बाह्यांगावर असलेल्या अलस कन्या या फक्त मंदिर शुशोभीकरण करण्यासाठी कोरण्यात आल्या नव्हत्या तर त्या भक्ताला आकर्षित करण्यासाठीच निर्माण करावेत, असे 'शिल्पप्रकाश' ग्रंथात उल्लेख करण्यात आला आहे.
३. मनुष्यास सांगितलेले चतुर्विध पुरुषार्थाचे पालन करीत अध्यात्मिक उन्नती साधावी हे मंदिरातील सभा मंडपातील रंग शिळेच्या स्तंभावर असलेल्या कामाशिल्पातून स्पष्ट होते.
४. जामखेडच्या खडकेश्वर मंदिरातील कामशिल्प हे प्रमाणाबध्द नसल्याने प्रस्तुत मंदिर उत्तर चालुक्य कालीन आणि पूर्व यादव कालीन असावे. तसेच मंदिराच्या समोर असलेले नंदी मंडप हे पूर्णतः यादव कालीन स्तंभावर उभे आहे.
खडकेश्वर मंदिराच्या गर्भगृहाला चार द्वारशाखा आहेत. या द्वारशाखांच्या पायाशी शैव द्वारपाल आहेत. मंदिरातील देवकोष्टकांत एका ठिकाणी गणेशाची मुर्ती आहे. दुसर्यात विष्णुची वराह अवतारातील मुर्ती आहे. उमा महेश्वराची पण मुर्ती आढळून येते.
मंदिराच्या बाहेर परिसरांत दोन भग्न मुर्ती आणि भव्य नंदीचे अवशेष आढळून येतात. हे जर मंदिरातील असतील तर मुळ मंदिर अतिशय भव्य असावे असा अंदाज बांधावा लागतो. सध्या जो नंदी आहे तो लहान आहे. नंदीला स्वतंत्र असा मंडप आहे. या मंडपाचेही छत ढासळले होते. गावकर्यांनी मंदिर दुरूस्त करताना नंदी मंडपाचेही छत दुरूस्त केले. चार खांबांवर हा छोटासा देखणा नंदीमंडप मंदिराच्या समोर उभारलेला आहे. खडकेश्वर मंदिर पश्चिममुखी आहे.
या परिसरांत पर्णकुटी बांधून सच्चीदानंद श्रीधर स्वामी कावसानकर (नाना काका महाराज) यांनी वास्तव्य केले. शिवस्वरूप वैकुंठवासी विनोदबाबा दाणे यांनीही या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम मनावर घेतले. या दोन सत्पुरूषांची प्रेरणा मिळाल्यावर गावकर्यांनी उत्साहाने कामाला सुरवात केली.
गावकर्यांची या मंदिरावर श्रद्धा असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे वर्गणी गोळा करून मंदिराचा जिर्णाद्धार केला. दगडूअप्पा सांगोळे आणि अशोक जाधव यांच्यासारखी मंडळी आजही तळमळीने मंदिरासाठी झटत आहेत. या मंदिराची नोंद पुरातत्त्व विभागाकडे आहे. पण कुठलाही निधी याला मिळालेला नाही. एकीकडे आपल्याकडे प्राचीन मंदिरांची दूरावस्था आढळून येते आणि दुसरीकडे जामखेडची मंडळी स्वयंस्फुर्तपणे काम करत आहेत तर त्याकडेही आपण लक्ष द्यायला तयार नाहीत. ही एक शोकांतिकाच आहे.
जामखेडच्या खडकेश्वर महादेव मंदिराकडे अभ्यासकांचे लक्ष्य जाण्याची गरज आहे. यातील शिल्पांवर अजून बारकाईने अभ्यास व्हायला हवा. डॉ. प्रभाकर देव, डॉ. देगलुरकर, डॉ. अरूणचंद्र पाठक यांनी मंदिराची दखल आपल्या पुस्तकांत घेतली आहे. त्यामुळेच या मंदिराचे महत्त्व समोर आले. मंदिर परिसरांत उत्खनन केल्यास मंदिराचा विस्तारीत पाया सापडू शकतो. मंदिर एका उंच चौथर्यावर उभे असण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्खनन झाल्यास मंदिराचा तलविन्यास संपूर्णपणे लक्षात येईल. हे मंदिर अगदी प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याने त्याचे महत्त्व फार मोठे आहे.
औरंगाबाद बीड रस्त्यावर अडूळच्या अलीकडे जामखेडकडे जाणारा फाटा फुटतो. मुख्य रस्त्यापासून आत वळल्यावर अगदी चार किमी अंतरावर हे गाव आहे. गावापर्यंत अगदी चांगला रस्ता आता तयार झाला आहे. मंदिर स्थापत्याच्या अभ्यासकांनी, इतिहासप्रेमींनी, हौशी पर्यटकांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. आतापर्यंत कुणाच्या लक्षात आले नसेल असे काही पैलू समोर आणावेत.
(जामखेड मंदिरा संबंधी काही माहिती हवी असल्यास अशोक जाधव 9763892727 यांच्याशी संपर्क करावा.)
(देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने प्राचीन मंदिरे मुर्ती वास्तू समाध्या मकबरे गढी वाडे यांच्या संवर्धन जतन संरक्षणासाठी अभियान राबविले जात आहे. आपल्या गावच्या अशा स्थळांबाबत माहिती आमच्यापर्यंत पोचवा. आमच्या अभियानात आपण सहभागी व्हा आणि आपल्याही गावच्या अशा कामासाठी आम्हाला सांगा.) (छायाचित्र सौजन्य Akvin Tourism)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
संदर्भ :-
१) जालना जिल्हा गॅझेटीयर
२) मराठवाड्याची मंदीरे-
३) श्रीकांत उमरीकर यांचे लिखाण
४) अरविंद सोनटक्के यांचे लिखाण
५) डॉ. प्रभाकर देव, अनु, कल्पना रायरीकर, मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार, अपरांत,











No comments:
Post a Comment