Friday, May 17, 2024

अंबरनाथचे शिवमंदिर

 मुंबईच्या धकाधकीच्या मागल्यात लोकल प्रवासातील एका स्टेशनचं नाह या पलीकडे अंबरनाथची कोणाला माहिती नसते, या व्यतिरिक्त लहान असताना शाळेत परीक्षेत येणार एक प्रश्न सर्वांनाच आठवत असेल तो म्हणजे ‘‘.......... येथे काडेपेट्यांचा कारखाना (होता, आता बंद झाला) आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करण्याचा कारखाना आहे ??? ’साहजिक उत्तर असायचं ....अंबरनाथ ! अंबरनाथची आणखी एक ओळख म्हणजे हे आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेले शहर. येथील आनंदनगर व पश्चिमेकडील केमिकल झोन या औद्योगिक वसाहतीत हजारो विविध प्रकारचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या आहेत ज्यात रोज लाखो कामगार काम करतात... तसेच अंबरनाथ येथे भारतीय नौसेनेचे NMRL (Naval Materials Research Laboratory) हे संशोधन केंद्र आहे. थोर अभ्यासक-संग्राहक-संशोधक श्री. वसंतराव कर्णिक यांचा परिचय काही जणांना असतो, पण याच उद्योगी उपनगरात हळेबीड-बेलूरचं स्मरण करून देण्याचे सामर्थ्य असणारं एक शिव मंदिर आहे याचा पत्ताच नसतो. आवर्जून पहावं असंच हे आगळे वेगळे शिवमंदिर आहे.
येथे घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे अंबरनाथ हे नेहमीच मुंबई-महाराष्ट्रात सतत चर्चिले जाणारे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु प्राचीन काळापासून अंबरनाथची खरी ओळख आहे ती येथील शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेल्या पुरातन शिवमंदिरामुळे.
बर्‍याचदा विकेंडचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्‍याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच एक ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर.
    प्राचीन काळापासून अंबरनाथची खरी ओळख आहे ती येथील शिलाहार राजांनी बांधलेल्या पुरातन शिवमंदिरामुळे. अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शैवपंथीय शिलाहारांच्या सत्ताकाळात बांधले गेले. आपल्या राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली त्यातील अंबरनाथचे शिवमंदिर आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. मंदिरात विविध प्रकारच्या लहानमोठय़ा अशा हजारो मूर्ती असून शिल्पकला आणि वास्तुकला यांचा सुरेख संगम या मंदिरात पहायला मिळतो. मंदिरातील शिवलिंग अंबरेश्वर म्हणुन ओळखले जाते आणि या नावावरून या शहराला अंबरनाथ हे नाव पडल्याचे सांगितले जाते. 
An Old Photograph of the Temple / Courtesy: UNESCO
An Old Photograph of the Temple / Courtesy: UNESCO



     कसे पोहचाल :-

  अजूनही अनेक मुंबईकरांना तसंच इथे येणाऱ्या पर्यटकांना या मंदिराची पुसटशीही माहिती नाहीये, असं दिसून येतं. इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. अंबरनाथ हे मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील एक रेल्वे स्टेशन आहे कल्याण सोडल्यावर कर्जत च्या दिशेने ३ रे स्थानक अंबरनाथ हे आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून ६० किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.


 IMG_20171008_105828.jpg
 अंबरनाथ स्थानकात उतरून पूर्व दिशेला शिवाजी चौक परिसरात येऊन सरळ खेर विभागाच्या दिशेने चालत निघालातत कि रेल्वे स्टेशन पासून साधारण दोन किमी अंतरावर वालधुनी नदीच्या काठी, अंबरनाथ व उल्हासनगरच्या सीमेवर हे प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून ऑटो रिक्षाही उपलब्ध आहेत. चालत गेल्यास २०-२५ मी लागतात व ऑटो रिक्षाने गेल्यास ५-१० मी मध्ये आपण मंदिर परिसरात पोहचतो. साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.
मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी उर्फ बढवाण नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो. एकेकाळी आंबा अन् चिंचेच्या दाट राईत हे मंदिर होतं. आता मोहमयी मायानगरी मुंबईच्या विळख्यात सापडल्याने झोपडपट्टीच्या पाऊलखुणा इर्ष उमटू लागल्या आहेत. खरं तर हा सारा परिसरच संरक्षित करून, त्याचं सौंदर्य वाढविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,



 
Ancient Indian Architecture


 2017-10-09_11.44.55.jpg
 
 
 
 2017-10-09_07.26.51.jpg


 
 
 ambernath wide
Lord Shiva Temple

 
 
 


 संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ चे हे एक प्राचीन मंदिर. १९९९ साली युनेस्कोने या मंदिराला दर्जा दिला आहे.  काही पौराणिक कथांमध्ये हे मंदिर पांडवकालीन असून हे मंदिर ५ पांडवांनी बांधल्याचे बोलले जाते.
अंबरनाथ शिवालय' पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे. सन १८६८ मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि 'Bombay branch of the Royal Asiatic Society' च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला. त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे १०६० मध्ये "...हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले", असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव 'आम्रनाथ' असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.
 अंबरनाथचे शिवमंदिर हे सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या, हे एका मध्य ठिकाणी आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा त्यावर प्रभाव पडला आहे. त्या सगळ्या राजांचा यावर प्रभाव पडला आहे.धारच्या भोज राजाच्या काळातील 'समरांगणसूत्रोध्दार' या शिल्पशास्त्रावरील ग्रंथात भूमीज मंदिर प्रकाराचा उल्लेख आहे. "काही लोक या मंदिराला हेमाडपंथी म्हणतात. पण हे चुकीचं आहे. भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू. हे असं एकच भूमिज मंदिर, ज्याचं द्राविडीकरण केलं गेलेलं आहे."
पुरातत्त्व विभागाची सुरुवात
भारतीय पुरात्त्व विभागाचा आणि अंबरनाथचा अगदी जवळचा संबंध आहे. ब्रिटिश अधिकारी सर कनिंगहम यांना इतिहासाची आवड होती. भारतभर फिरताना सर्वत्र विखुरलेल्या मोडकळीस आलेल्या वास्तूंचे अवशेष त्यांनी पाहिले होते. १८६१ मध्ये सर कनिंगहम यांनी त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांना लिहिलेलं पत्र महत्त्वाचं आहे."भारताच्या ब्रिटिश अमलाखाली असलेल्या प्रदेशातून, कोणत्याही प्रांतातून, हिंडताना प्राचीन वारशाबद्दलची उदासीनता जाणवते. अत्यंत रेखीव आणि कलात्मक असूनसुध्दा प्राचीन वास्तूंची, स्मारकांची हेळसांड खिन्न करणारी आहे. जागोजागी पुरातन भारतीय संस्कृतीचे सुंदर अवशेष अगदी दुर्लक्षित अवस्थेत पडलेले दिसतात. दुर्लक्षित' हा शब्द दुरुस्ती, डागडुजी, ह्याला उद्देशून नाही, इतक्या अवशेषांना दुरुस्त करणे, ही खर्चाच्या आणि परिश्रमाच्या दृष्टीने कोणत्याही सरकारच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण त्यांची साधी नोंदसुध्दा नसावी, ही फार खेदाची बाब आहे.
 माझ्या मते सरकारकडून ह्या महत्त्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या कर्तव्याचं पालन अगदी कमी खर्चात करता येण्यासारखं आहे. सर्वत्र विखुरलेल्या या अवशेषांची पाहणी करून, शोध घेऊन, व्यवस्थित नोंद करून ठेवली तर भावी पिढ्यांना ती उद्बोधक ठरेल. एरवी पुढच्या पिढ्यांना स्वतःचा इतिहास समजणार कसा?
जेम्स फर्ग्युसन आणि कर्नल मेडोज टेलर, यांच्याकडून पत्रांद्वारे अशाच प्रकारचे अभिप्राय मिळाल्यानंतर एका विचारमंथनाअंती आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा पुरातत्त्व विभागाचं (ASI) बीज रोवलं गेलं.
 
Image copyrightAIIS AMERICAN INSTITUTE OF INDIAN STUDIES GURGAON
 
पहिले नकाशे, फोटो आणि ठसे
 इ.स. १८६८ साली प्रथम भारताच्या चार दिशांकडील चार स्मारकं प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासायचं ठरलं. या सर्व्हेअंतर्गत फोटो, ड्रॉईंग्ज, नकाशे, मॉडेल्स आणि ठसे कशा तऱ्हेने घ्यावेत, याच्या सूचना बारीक तपशिलासह नोंदवण्यात आल्या. या चार स्मारकांपैकी पश्चिम भागातून निवडलं गेलं बॉम्बे प्रांतातलं अंबरनाथाचं मंदिर. सुदैवाने त्याच सुमारास म्हणजे १८५३ मध्ये मुंबई-कल्याण रेल्वे सुरू झाली आणि मुंबईतच 'स्कूल ऑफ आर्ट' होतं. या कामासाठी सरकारकडून १३ हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं. आणि १८ नोव्हेंबर १८६८ रोजी एक टीम अंबरनाथमध्ये दाखल झाली. यात स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक G. W. टेरी, एक हेड मोल्डर, एक ड्राफ्टमन आणि आठ विद्यार्थ्यांच्या समावेश होता. त्यावेळी अंबरनाथची लोकसंख्या ३०० च्या आसपास होती. तब्बल वर्षभर काम करून १०,७१४ रुपये ३ आणे आणि १ पै खर्च करून २४ आराखडे,३५ फोटो आणि ७६ साचे अंबरनाथ मंदिराचे तयार करण्यात आले.

शिलाहार राजवंश -

याच ठिकाणी शिलाहारांबद्दल थोडीफार माहिती दिली, तर ती अस्थानी होणार नाही. मूळच्या प्रबळ अशा शिलाहारांच्या पुढे तीन शाखा झाल्या.सुवर्ण गरुडध्वजधारी उत्तर कोकणचे शिलाहार बहुदा राष्ट्रकूट व चालुक्यांचे सामंत असावेत. अमरनाथ (आम्रनाथ?) मंदिर उभारणारा मुम्मुणी शिलाहार हा चालुक्य राजवंशातील पहिल्या सोमेश्वराचा समकालीन व मांडलिक असावा. या शिलाहारांना "तगरपुर परमेश्वर" असा किताब होता. उरलेल्या शिलाहारांचे राज्य दक्षिण कोकण व कराड-कोल्हापूर भागात होते. शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली तर काही मंदिरे आजही त्यांचं अस्थित्व टिकवून आहेत. अंबरनाथ चे मंदिर त्या पैकीच एक,
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली.शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.

मंदीराचे स्थापत्य :-

 या मंदिराचे स्थापत्य वैशिष्टयाव्यतिरिक्तही अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर एक शिलालेख असून त्यात मंदिराचे बांधकाम ठाणे येथील शिलाहार राजा मुम्मुणिराज याच्या कारकिर्दीत शक संवत ९८२ (सन १० जुलै १०६०) रोजी पूर्ण झाले असा उल्लेख आहे. हा शक संवत्सराचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भूमिज प्रकारातील सर्वात प्राचीन मानले जाणारे माळच्यातील उदसयपूर येथील उदयेश्वर मंदिर साधारणपणे याच सुमारास, म्हणजे इ.स. १०६९ मध्ये बांधले गेले. मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली.मात्र त्या देवळातील पूजाअर्चा वगैरे धार्मिक विधींना सुरुवात इ.स..१०८० मध्ये झाली. त्यामुळे या दृष्टिकोनातून अंबरनाथ येथील शिवमंदिर उदयेश्वर मंदिरापेक्षा प्राचीन आहे असे वाटते. शिलालेखामध्ये मंदिराचा उल्लेख, "श्री अंबरनाथ देवकुल" असा करण्यात आला आहे. 
ambernath west
 शिल्पसंहितांनुसार भूमिज मदिरे पुढीलप्रमाणे तीन प्रकारची असतात चतुरस्त्र, वृत्तसंस्थानक आणि अष्टशाल हे तीन प्रकार होते. अष्टशाल या प्रकारात गर्भगृहाला आठ भद्र असतात. अंबरनाथ मंदिराचा तलविन्यास तारकाकृती आहे. मंडप आणि गर्भगृहाच्या बाहयरेषा एकमेकांना कोपऱ्यात छेदणाऱ्या चौरसासारख्या आहेत. अंबरनाथचे शिवमंदिर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदिर म्हणून ओळखले जाते. अंबरनाथ हे जरी महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन भूमिज मदिर असले तरी या मंदिराला त्याची स्वतःची अशी खास वैशिष्टये आहेत. या वैशिष्टयांमुळे ते माळव्यातील उदयेश्वर मंदिरासारख्या सर्वसाधारण भूमिज मंदिरापेक्ष काही अंशी भिन्न आहे. हे मंदिर  शिल्पशास्त्राप्रमाणे सप्तांग भूमिज पद्धतीत मोडते. भूमिजशैली ही नागरशैलीची उपशैली समजली जाते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे.या मंदिराचा तलविन्यास सप्तरथ असून त्याचे शिखर सात मजली आहे (सप्तभूम भूमिज प्रासाद). एकावर एक असे सात भूमी (म्हणजे शिल्प रांगा) रचण्यात आले होते; मात्र कालांतराने गाभाऱ्यावरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांगा) शिल्लक आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची रचना या मंदिराचा अभ्यास करून करण्यात आली आहे असे म्हणतात.  हया भूमी किंवा मजले बहुतेकवेळा मुख्य शिखरावरील उत्सेधात्मक सात शिखरप्रतिकृतींनी म्हणजे एकावर एक अशा सात प्रतिकृतींच्या रांगांनी सूचित केले जातात. या शिखर प्रतिकृतींच्या रांगा मुख्य शिखरावरील चार लतांच्या मधल्या भागात असतात. या चार मुख्य दिशांना असणाऱ्या लता चैतयगवाक्ष-प्रयोजनांनी अलंकृत केल्या जातात. अंबरनाथ मंदिरावर असलेल्या शिखरप्रतिकृती मात्र मुख्य शिखराच्या प्रतिकृती नाहीत. त्या दाक्षिणात्य (द्राविड) पद्धतीची शाला शिखरे आहेत. त्यांना शिल्पशास्त्रांच्या तांत्रिक भाषेत स्तंभकूट संबोधले जाते. मंडपावर चौकोनी, शंक्वाकृती शिखराऐवजी घंटासंवरण प्रकारचे शिखर आहे. शिल्प संहितांमध्ये "द्राविडकर्म" या प्रकारचे वास्तु-अलंकरण सांगितले आहे. कृष्ण देवांच्या मते अशा प्रकारच्या शिखर-रचना करणे म्हणजेच द्राविडकर्म असावे. तसे असल्यास अंबरनाथचे मंदिर या प्रकारचे अलंकरण असलेले महाराष्ट्रातील पहिले मंदिर होय.आज शिखर भग्नावस्थेत आहे परंतु पूर्वी ते किती उत्तुंग आणि नक्षीदार असेल ह्याची कल्पना आपल्याला येते. मंडपाच्या शिखराचा आकार पिरॅमिडप्रमाणे कोनासारखा आहे, याला “संवरण” म्हणतात. शिखरांच्या चार कोनांकडे पाहिल्यास खांबाप्रमाणे कोरीवकाम त्याचे केलेले आहे. दुरून पाहिल्यास ते खांबच वाटतात.
 
 अंबरनाथ मंदीराचा तलविन्यास

 अंबरनाथ येथील शिवमंदिर हे महाराष्ट्रातील शिल्पकलेचा जणू खजिनाच आहे. मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून त्याशिवाय उत्तर व दक्षिण बाजूस आणखीन दोन प्रवेशद्वारे मंदिराला आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये असे बांधकाम पाहण्यास मिळते. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराची आठवण या ठिकाणी नक्कीच येते. हे मंदिर उभारताना गणिताचा विशेषत: भूमितीचा वास्तुशास्त्रात विचार केला गेल्याचे सहज लक्षात येते. केवळ दर्शनासाठी न जाता येथील स्थापत्यशास्त्राचा थोडा अभ्यास केल्यास हे आपल्याला हे सहज लक्षात येते. मंदिराचे प्रवेशदाराजवळ शिलालेख असल्याचे वाचनात येते पण आता मात्र तो तेथे व मंदीर परीसरात नाही.एशियाटीक सोसायटीच्या जर्नलमध्ये खंड ९वा, पृष्ठ २१९ आणि खंड १२वा, पृष्ठ ३२९ मध्ये हा शिलालेख प्रसिद्ध झाला आहे.
    खडकात भव्य प्राकार खोदून त्या प्राकारात जमिनीच्या पातळीवर हे मंदिर उभारले आहे. मंदिराभोवतालची प्राकार भिंत कालौघात नष्ट झाले असुन मंदिर परीसरात कोसळलेल्या भागांचे अवशेष दिसुन येतात. 
 
 
2017-10-09_11.43.47.jpg
मंदिराच्या प्रांगणातच एक बांधीव तळे असुन या तळ्यात दोन बाजूंनी उतरणाऱ्या पायऱ्यांच्या कोपऱ्यात कोरीव मुर्ती दिसुन येतात. दुसरा मोठा तलाव मंदिराच्या पुर्व बाजुला असुन हा बहुधा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.एकेकाळी अंबरनाथ गावाच्या बाहेर असलेले हे मंदिर आज मध्यवर्ती ठिकाणी आल्यासारखे वाटते. 

हत्ती आणि माहूत

काम दिलेल्या माणसाने मनसोक्त कोरीवकाम केलेले आहे.

मंदिर विस्तीर्ण पीठावर उभे आहे. सध्याच्या जमिनीच्या पातळीच्या वर कुंभ, अंतरपत्र, ग्रासपट्टी,गजथर आणि नरथर असे पीठाचे थर आहेत. त्यामुळे हे पीठ साध्या पीठापेक्षा अधिक अलंकृत आहे असे म्हणता येत. पीठाच्या विविध आडव्या थरांवर गुजरातमधील कलेचा प्रभाव दिसून येतो.
   पीठाच्या वर मंडोवर असून यात तवंगानी अलंकृत केलेला कुंभ भागाचा मधूनमधून देवमूर्ती असलेला पट्ट, अतरपत्र, कपोताली इत्यादी भाग आहे. त्यावर जंघा, उद्गम, भरणी, शिरावटी, मंचिका, कपोताली आणि छादय आहेत. त्यावर गर्भगृहावरील शिखराला सुरुवात होते.








   मंदिराला तलविन्यास आधीच नमूद केल्याप्रमाणे तारकाकृती आहे. त्याची परिणती गर्भगृह आणि मंडपाच्या बाह्यांगावर अंगे आणि सलीलांतरे येण्यात झाली आहे. परिणामी पुढे आलेल्या स्तंभाच्या दोन उपलब्ध बाजूंवर मूर्तीची जोडी आहे आणि गर्भगृहाच्या तीन मुख्य भद्रांवर रथिका आहेत. भूमिज मंदिरांमध्ये सर्वच भद्र आणि अंगभागावर मूळ शिखराची प्रतिकृती असलेली लघुशिखरे असतात. त्यामुळे कपोतालीवर अशा लघुशिखरांची एक ओळच निर्माण होते आणि त्यातून प्रकाश आणि सावलीचा एक सुंदर आविष्कार तयार होतो. या मंदिरावरही अर्थातच ह्या छायाप्रकाशलीलेचे सुखद दर्शन घडते. हे शिवमंदिर असल्याने ह्या मंदिराच्या स्तंभाच्या बाह्यांगावरील मुख्य देव शिवपरिवारातीलच आहेत. अंतराळाच्या बाह्यांगावर गणेश आणि कार्तिकेय आहेत. गर्भगृहाच्या बाजूच्या दोन मद्रांवर महाकाली आणि गजासुरसंहारमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागील बाजूच्या मद्रावर हरि-हर-पितामहार्क आहे.
सध्या मंदिराला कळस नाही. पण प्रख्यात संशोधक बर्जेस याने कळसाचे काही भग्नावशेष आढळले होते अशी नोंद केलेली आढळते.
 
 ambernath nandi kid
 
मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. पैकी प्राचीन नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.

ह्या मंदिराला सभामंडप, अंतराळ व नंतर गर्भगृह आहे. प्रत्येक मंडपाचा कोन एकमेकांना जोडून त्यांची मांडणी केलेली आहे. शिवाय भिंतींची मांडणी अशी आहे कि, बाहेरून हे दोन्ही नक्षत्राकृती भासतात. या मंदिराच्या पृष्ठभागावर देवदेवता, अप्सरा, यक्ष, व्याल, गजथर, किर्तीमुख असे शिल्प कोरलेले आहेत.या मंदिराची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गाभारा आणि सभामंडप है दोन अनुक्रमे छोटे व भोठे चौरस एकमेकांना कोपऱ्यात चिकटले आहेत. पण प्रत्यक्ष संयोगस्थानी तेथे भिंत बांधल्याने कोपरे एकमेकात विलीन झाले आहेत. देवालयाचा प्राकार पूर्व पश्चिम ५० मीटर अन् दक्षिणोत्तर ३५ मीटर होता. तर आतील मंदिर १९ मी/७९ फूट x २४ गी/७३.५ फूट आहे. सध्या मंदिराची उंची जवळजवळ २१ मी. आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरलं की, अठरा खांबांच्या भव्य सभामंडपात्त प्रवेश होतो. सध्या त्यातील चारच स्पष्ट दिसतात. उरलेले चौदा, आधार-भिंतींमध्ये बुजवले गेले आहेत. तसूभरही जागा न सोडता बारीक नकसकामाने हे सारे खांब मढवून टाकले गेले आहेत. सभामंडपाचे छत व कळस यामधील भाग पोकळ आहे. दक्षिण दरवाज्याजवळ वरच्या बाजूस असणाऱ्या झरोक्यातून त्यात जाता येते. किंवा बाहेरच्या बाजूने उत्तरबाजूकडून वर चढून जाता येते. सभामंडप व गाभाऱ्याची बाहेरची बाजू बहुकोनयुक्त आहे. त्यामुळे तेथील छाया-प्रकाशाचा खेळ वेधक ठरतो. आणि त्यातच ठोकळेबाज चौकोनीपणा केव्हाच लपून जातो.

ambernath entry roof

ambernath column sculpted

मंदिरातील सभामंडपात चार खांब दिसून येतात. (आता सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडी खांब व बीम ने त्यांना support दिला आहे ) मंदिराच्या मंडपात चौरस रंगशिला असून त्यावर चतुष्की आहे. ज्यावर एकेकाळी नंदी असू शकतो, असे वाटते. या चार स्तंभांवर घुमटाकार छत पेलले आहे. या छताच्या खालच्या भागापासून उत्तरोत्तर लहान होत जाणारी वर्तुळे आहेत. सर्वात वर कमळाचा आकार कोरला आहे. त्यामुळे हे घुमटाकार छत उलटया कमलपुष्पासारखे भासते. मात्र चतुष्कीच्या चार बाजूंच्या चार भागांवर मात्र बाह्य भागाकडे निमुळती होत जाणारी छते आहेत. ही छते रंगशिलेवरील छताच्या तुलनेत कमी अलंकृत आहेत. 

  चौरस रंगशिळेवरुन  वरती पाहिल्यास मधल्या गोलाकार छताची रचना एककेंद्री वर्तुळाची मालिका असल्याप्रमाणे आहे.पाण्यावर टाकलेल्या दगडामुळे जशा लहरी उमटतात तशी ती दिसतात. एका बिंदूभोवती मोठी होत जाणारी वर्तुळ काढली तर नेमके असेच दिसले हे प्रत्यक्षात पाहिल्यावर जाणवते. ह्या प्रकाराला सभापद्म प्रकारचे छत म्हणतात.
 बाजूला सभामंडपाचे चार-चार खांबांच्या रांगा दोन बाजूला असून संपूर्ण सभामंडप त्यावर तोललेला आहे. मंदिराच्या सभामंडपात कोरलेले खांब म्हणजे अतिशय आकर्षक ठेवा आहे. अबूच्या विमलसा मंदिरातील स्तंभांचीच त्यामुळे आठवण होते. याशिवाय पश्चिम व दक्षिणेच्या दारांजवळच्या मुखमंडपांजवळ दुसऱ्या तन्हेचे अन् उतरेच्या मुखमंडपाजवळ तिसऱ्या तन्हेचे स्तंभ आहेत. खरं तर पूर्वी हे सारखेच असावेत कारण शेजारच्या अर्ध स्तंभांप्रमाणे रचना असणारे मूळ खांब असावेत. नंतर काही कारणाने बदलते वेळी चौकोनातून गोलाकारात रुपांतर होणाऱ्या खांबांऐवजी पूर्ण चौकोनी असणारे खांब बसविले गेले असावेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत सुंदर अशा प्रतिमा कोरल्या आहेत. त्यांची संख्या ७०च्या आसपास आहे. विविध मुद्रांमधील शंकर-पार्वतीच्या मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख कामदेवाची अष्टभुजा मूर्ती आहे. कामदेवाच्या मुर्तीची एकूणच कमनीयता, अलंकार स्पष्ट आणि नाजुकतेने कोरले आहेत. मंदिरात तीन तोंडे असणारी एक त्रिमुखी मूर्ती आहे. हे बहुधा शंकर पार्वतीचे शिल्प असावे कारण मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे.

ह्या मंडपाचे छत समतलवितान आहे म्हणजेच सपाट आहेत. भारवाहक यक्ष इथे मात्र लक्ष वेधून घेतात. संपूर्ण स्तंभ चहू बाजूंनी शिल्पांनी सजलेले आहेत. त्यावर काही ठिकाणी मैथुनशिल्पसुद्धा आढळतात. स्तंभावर विष्णू, शिव व पार्वती, गणराय तर काही ठिकाणी योगी कोरलेले दिसून येतात. सभामंडपात असलेला परंतु तिथे नंदी नसलेला हा मंडप अंतराळाला चिकटून उभा आहे. हा संपूर्ण मंडप बंदिस्त असल्यामुळे ह्याला गुढमंडपसुद्धा म्हणतात.गुढमंडपातून पुढे अंतराळ आहे. दोन्ही बाजूला भिंतीत देवळ्या असून त्याला खांब व कमान आहेत. ह्यालाच “देवकोष्ठ” म्हणतात ज्या मध्ये मूर्ती नाही. अंतराळाचे छत सपाट आहे. संपूर्ण एक शिळा तिथे वापरलेली आहे व त्यावरसुद्धा नक्षीकाम आहे.
     सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वतुर्ळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. मंडपातील अर्धमंडपातील स्तंभही उल्लेखनीय  आहेत. हया दोन प्रकारच्या स्तंभांवर येणारे घटक आणि त्यांचा क्रम सारखाच आहे. हे स्तंभ गुजरातमधील त्याच काळात बांधल्या गेलेल्या सोळंकी मंदिरांमधील स्तंभाशी मिळतेजुळते आहेत. या स्तंभांचे तळखडे चौरस असून त्यावर तीन अष्टकोनी घटक, त्यावर वर्तुळाकार घटक, वर पीठाकृती शीर्ष आणि त्यावर कीचकहस्त आहेत. स्तंभांमधील खांब आणि अष्टकोनी घटकही पुराणाकथांशी संबंधित असलेल्या मूर्तिशिल्पांनी युक्त आहेत. अर्धमंडपातील स्तंभांवर मात्र कीचकहस्तांऐवजी साधे नागशीर्ष हस्त आहेत.
      गुढमंडपातून पुढे अंतराळ आहे. दोन्ही बाजूला भिंतीत देवळ्या असून त्याला खांब व कमान आहेत. ह्यालाच “देवकोष्ठ” म्हणतात ज्या मध्ये मूर्ती नाही. अंतराळाचे छत सपाट आहे. संपूर्ण एक शिळा तिथे वापरलेली आहे व त्यावरसुद्धा नक्षीकाम आहे. द्वारललाटबिंबावर गणराय असून वरती उत्तररांग आहे. ह्या उत्तररांगात शिव व इतर देवता कोरलेल्या आहेत. उंबरठ्याला मंडारक म्हणतात त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे व इथे अर्धचंद्राकृती पायरी असल्यामुळे त्याला “अर्धचंद्रशिला” असेही म्हणतात.
हे मंदिर पाहताना किती योजनापूर्वक कोरलेले असेल, हे जाणवते.

गर्भगृह -

गाभाऱ्याच्या गणेश पट्टीत योगी शिव कोरलेला आहे. त्यावर सकाळी १० ते दुपारी ४ उजेड असतो, तेव्हा हे शिल्प लक्षात येते. एरवी अंधारच आहे.  द्वारललाटबिंबावर गणराय असून वरती उत्तररांग आहे. ह्या उत्तररांगात शिव व इतर देवता कोरलेल्या आहेत. उंबरठ्याला मंडारक म्हणतात त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे व इथे अर्धचंद्राकृती पायरी असल्यामुळे त्याला “अर्धचंद्रशिला” असेही म्हणतात. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या असुन तळात किर्तीमुख कोरले आहेत. प्रत्यक्ष गाभारा सभामंडपाच्या पातळी खाली जवळजवळ सव्वादोन मीटर आहे. तेथवर जायला डझनभर पायऱ्या आहेत. प्रत्यक्ष गाभाऱ्याचे आता कठडा घालून दोन भाग केले आहेत. गाभाऱ्यात उत्तराभिमुखी दोन शिवलिंगे आहेत. मूळ मंदिरात शिवलिंग नसल्याने अलीकडच्या काळात गाभाऱ्यात दोन शिवलिंग स्थापित करण्यात आली आहेत. गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी एक उंचवटा आहे यालाच स्वयंभू शिवलिंग मानून त्याची पूजा केली जाते. पैकी प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आणि स्वयंभू आहे. दुसरे गारगोटीचे घडीव आहे. गाभाऱ्याच्या भिंती अडीच मीटर जाडीच्या आहेत. तर उंची जवळपास २१ मीटर आहे.गाभाऱ्याच्या वरील शिखर कोसळलेले असल्याने तेथुन वर पाहिले असता शिखराच्या अंतर्गत भागाचे अवशेष दिसतात व विवरातून आकाशदर्शन होते. गाभाऱ्याच्या तळापासून शिखराची उंची साधारण ४० फुट आहे.  गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे.

 हा गाभारा दगडी चिरे लावून बंद करण्याची काही व्यवस्था असावी अशा खुणा कोपऱ्यांवर आढळतात. गुजरात येथील मोढ्याच्या सूर्य मंदिरात आणि काठेवाड्यातील पट्ट्यांच्या सोमनाथ मंदिरात असा गाभार बंद करण्याची सुविधा आढळते या सर्व मंदिराच्या उभारणीच्या काळातच मूर्तीभंजक, आक्रमक, धर्माध मुसलमानांच्या स्वाऱ्या सुरु झाल्या. त्याचा हा परिणाम असावा.खरं तर गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर असणारं, बाहेरच्या बाजूचं शिल्प, मूळ मंदिर कोणाचं असावं? याची कल्पना देते.
  काही अगम्य कारणामुळे देवळाच्या आत फोटोग्राफीला बंदी आहे. यामुळे नेमके काय साध्य होते ते कळत नाही.

मंदीराचे मंडोवर अर्थात बाह्यभिंतीवरची शिल्पकला :-

मंदिराच्या बाह्यांगाचे शिल्पकाम गेल्या हजार वर्षात उन-पावसाचे तडाखे खाऊन बरेच झिजून गेले आहे. सध्या तर प्रदुषणामुळे त्यास अधिक वेगाने ठिसूळपणा येऊ लागला आहे. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर तोलून धरलेले आढळते. हा गजथर सर्वात खालच्या बाजूला आहे.  

देवळाच्या मागील भाग
या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी.


हे कोरीव खांब ..







ambernath tilt up

ambernath devata2

ambernath shilpa

ambernath side

 ambernath Lataambernath stone carvingsambernath slantedambernath shikhar2ambernath projectionsambernath shikhar

मंदिराच्या बाह्यांगावर अनेक देवदेवतांची शिल्पे कोरली आहेत. शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. या शिल्पांमध्ये विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, शृगांरिक कामशिल्पे, गरुडारूढ विष्णू, विवाहपुर्व शोडषवर्षीय पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरासुर वधमूर्ती, नृत्यांगना, द्वारपाल, नटराज, नरमुंडधारी महाकाली, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवतार मूर्ती, महिषासुरमर्दिनी, हंसारुढ ब्रम्हदेव या मूर्ती अत्यंत कुशलतेने कोरल्या आहेत. दगडात कोरलेल्या या मुर्तीतून त्या काळची आभूषणे आणि वेशभूषा साकारलेल्या आहेत. मात्र त्यातील अनेक मुर्तीची काळाच्या ओघात झीज झाली आहेत.  या मंदिरावर दाखविण्यात आलेली शिवाची उललेखनीय खरुपे म्हणजे मार्कडेयानुग्रह, कल्याणसुंदर आणि लिंगोद्भव शिव. विष्णूचे काही अवतार आणि रुपेही मंदिराच्यास भिंतीवर दाखविण्यात आली आहेत. मंदिराच्या कोणांवर दिक्पाल दाखविले आहेत. ब्रह्मदेवाला या मंदिरात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मंडपाच्या इशान्य कोपऱ्यात ब्रह्मदेवाचे एक लहानसे मंदिर आहे.






ही गणेशमूर्ती....

हा बहुधा नृत्य गणेश असावा.

त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...

आदिमायेचं रौद्ररुप !!

ब्रम्हदेव सपत्नीक मूर्ती 

आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.

आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प
ambernath sur sundari

ambernath devataambernath sculpted

 
 
 
 त्यानंतरच्या घरात जवळजवळ सत्तर मूर्ती दृष्टीच्या टप्प्यात आहेत. पण तिथवर सहजी हात पोहोचणार नाही इतपत उंचीवर त्या खोदल्या आहेत.
पश्चिमद्वारातून बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा सुरू केली की, पहिल्याच कोनात दीड मीटर उंचीवर उजव्या सोंडेचा गणपती आहे. त्यानंतरच्या कोनात आपल्याकडे न बघता दुसरीकडे पहाणारा पुरुष पाहून आश्चर्यचकीत झालेली स्त्री उजवा हात अचंब्याने तोंडाकडे घेऊन उभी असलेली कोरलेली आहे. त्यानंतरच्या कोनात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती आहे. नंतरच्या कोनात अतिशय प्रमाणबद्ध अशी लंगोटीधारी व कमंडलू घेतलेल्या दाढी वाढवलेल्या गोसाव्याची आकृती कोरलेली आहे. त्या मागच्या कोनात लक्ष्मीची मूर्ती आहे. पण तिच्याकडे पाठ फिरवून पुढच्या कोनात असणाऱ्या विष्णूकडे जाण्याचा अविर्भाव या बैराग्याच्या शिल्पात उतरला आहे. ऐहिक वैभव लाथाडून चिरंतन-शाश्वत मोक्षाकडे जाण्याचा उपदेश तर यातून सूचित करावयाचा नसेल ना ?
उत्तरद्वारानंतर जमिनीलगत एक देवळासारखी खोली आहे. त्यात शिवलिंग, पर्वताकार पाषाण व पार्वतीची मूर्ती आहे. मूळ मंदिरानंतर हे बांधकाम केल्याचे जाणवते. यानंतर गाभाऱ्यातील अभिषेक जल वाहून आणून कुंडात सोडले आहे. तेथून वाट काढून ते नदीत नेऊन सोडले आहे.
या मंदिरातील शिल्पामध्ये आठ हात असलेली एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ती अत्यंत सुबकपणे कोरलेली असून, कामदेवाचे शरीरसौष्ठव, अलंकार सुस्पष्टपणे आणि नाजूकपणे कोरलेले आहेत. या मंदिरातील एका मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. तिला तीन तोंडे असल्यामुळे तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात.
काही ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म हातात घेतलेला उंच मुकुट परिधान केलेला विष्णू दिसून येतो. उग्र स्वरूपाची शस्त्रधारी दुर्गा म्हणजे आदिमायेचे संहारक रूपाचे शिल्प इथे पाहता येते. गजासुराचा वध सुद्धा इथे शिल्पात कोरलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने मूर्ती कोरुन कलाकार कलेच्या माध्यमातून देवाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर बिंबवत असतो.
कुंडाच्यावर त्रिमूर्ती शिव कोरलेला आढळतो. शिवाच्या डाव्या अंकावर पार्वती बसलेली आहे. (काही तज्ञांच्या मते हे शिल्प त्रिमुखी ब्रह्मा व पत्नी सावित्रीचं आहे.) तर वरच्या कोनाड्यात नरमुंडधारी अक्राळविक्राळ अन् भितीदायक अशी महाकाली कोरलेली आहे. कृश शरीराच्या या महाकालीची हाडे देखील दिसतात. कृश स्तन लोंबणारी, वाळलेले हातपाय असणारी ही मूर्ती आहे. गळ्यात मानवी शिरांची माळ आहे. तर कमरेला सर्पमेखला आहे. वरच्या उभट पट्टधात चंद्रकोरीत नटराजाची मूर्ती आहे.
नंतरच्या कोनात शिवपार्वती विवाह सोहळा दाखवला आहे. यातील महादेवाच्या हातात त्रिशूळ आहे. यानंतरच्या कोनात एक प्रकाश स्तंभ रूपी शिव आणि हंसारूढ ब्रह्मदेव व वराहरूपी विष्णू दाखविले आहेत.
दक्षिण दरवाज्याजवळील कोनात कानावर हात ठेऊन लगट करणाऱ्या स्त्रीला टाळून पुढे असणाऱ्या तरूणीकडे जाणारा साधू कोरला आहे. दक्षिण दारालगतच शेंदूर चर्चित गणपतीची मूर्ती आहे.
 येथील वैशिष्ट्य म्हणजे चार मुखांचा ब्रम्हदेव इथे दिसतो. ब्रम्हदेवाचे चौथे मुख मागे असून पुढून फक्त तीनच मुख दिसतात.
चौरीधारी शालभंजिका, आरसा घेतलेल्या शालभंजिका, लज्जावती, नृत्यांगना, कच्छमुक्ता, वृक्षदेवता, द्वारपाल, मिथुनशिल्पे, आठ हातांचा कामदेव, चार हातांचा विष्णू, महिषासुरमर्दिनी, त्रिमुखी ब्रह्मा, मोहिनी, गणपती, कार्तिकेय अशा इतरही अनेक उल्लेखनीय मूर्ती आहेत. यांचे अविर्भाव, झोक, डौल, वेशभूषा, दागदागिने, शस्त्रे अतिशय सुबकपणे कोरली आहेत. पण गेल्या हजार वर्षात झालेल्या पाऊसपाण्याच्या माऱ्याने त्यांचे तपशील नष्ट होऊ लागले आहेत.
याशिवाय मंदिराच्याच बाह्यांगावर सुमारे पावणेदोन मीटर उंचीवर एक लहानशी पट्टी कोरलेली आहे. त्यामध्ये शृंगारिक कामशिल्पे, संभोग शिल्पे व कामक्रिडा करणाऱ्या अनेक आकृती कोरलेल्या आहेत. पण त्यातील बऱ्याच झिजून गेल्या आहेत.

अपेक्षा :-

     लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिकांसह लांबून आलेल्या भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागलेल्या दिसतात. वर्षभरातील इतर सोमवारच्या तुलनेत श्रावणातील सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. तसेच इथे महाशिवरात्रीला मोठीजत्रा भरते , हि जत्रा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा असल्याचे बोलले जाते.  महाशिवरात्रीला अंदाजे दोन-अडीच लाख लोक येतात.
  आपल्याकडे एवढा अमूल्य ठेवा आहे मात्र तो आपण जपायला हवा. मंदिराच्या परिसरात काहीच करायला नको. आज अंबरनाथच्या शिवमंदिराच्या अगदी काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. तसंच येथील MIDC च्या प्रदूषणाचाही परिणाम या मंदिरातील दगडावर होतोय.
   हे मंदिर मोठं पर्यटनस्थळ व्हावं, असं वाटत असले, तरी तशा सोयीसुविधा नाही आहेत. आजही मंदिराच्या आवारात तुम्हाला टॉयलेटची सोय नाहीये. तसंच मंदिराबद्दलची खूप चुकीची माहिती पसरवली जाते. मंदिर आवारात याबद्दल एखादी माहिती पुस्तिका वितरीत केली जावी, जेणेकरून लोकांना या मंदिराच्या इतिहासाबद्दलची खरी माहिती कळेल.


  या वास्तूला आता हजार पूर्ण होत आहेत. पूर्वी पेक्षा आता मंदिरात खूप बदल झाले आहेत. पूर्वी मंदिराच्या समोरील बाजूस काहीच नव्हतं. पण आता तिथे सुंदर बाग करण्यात आली आहे. तसंच येणाऱ्या भाविकांना इथे महाप्रसादही दिला जातो. मुंबईच्या इतक्या जवळ असूनही हे मंदिर दुर्लक्षितच राहिलं. आता मागील ४-५ वर्षांपासून या मंदिराकडे लक्ष दिलं जात आहे. मात्र हे फार पूर्वीच व्हायला हवं होतं. जर हे स्थळ पूर्वीच पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलं असतं तर आजचं चित्र फार वेगळं असतं. आता रस्ते, मंदिरातील लाद्या ते बसवल्यामुळे भाविकांची सोय झाली आहे."
   मागील तीन वर्षांपासून एका स्थानिक पक्षातर्फे महाशिवरात्री दरम्यान इथे आर्ट फेस्टिव्हल भरवला जातो आणि त्याच्या बऱ्याच प्रमाणात जाहिरातीही केल्या जातात. त्यामुळे या मंदिराबद्दल थोडी जनजागृती होऊ लागली आहे. परंतु जशी केवळ महाशिवरात्रीसाठी इथे स्वच्छता केली जाते, तशीच स्वच्छता नेहमी राहावी, अशीही अपेक्षा इथे येणारे पर्यटक आणि स्थानिक व्यक्त करतात.
        २०१५ साली अंबरनाथचे खासदार (कल्याण लोकसभा क्षेत्र) डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी "शिवमंदिर आर्ट फेस्टिवल" चे आयोजन करून अनेक जागतिक कलाकारांना एकाच मंचावर बोलावून एक सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यात जगात विख्यात पंडित जसराज,  पद्मश्री हरिहरन, प्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी, इत्यादी अनेक प्रसिद्ध कलाकार माननीय खासदारांनी "शिवमंदिर आर्ट फेस्टिवल" च्या निमित्ताने अंबरनाथ येथे बोलावून अंबरनाथकरांना एक आगळीवेगळी भेट दिली होती तसेच विविध चित्रांचे प्रदर्शन, पुरातन शस्त्र प्रदर्शन, पुरातन वस्तू, चित्रकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम घेऊन, अंबरनाथकारांची मने जिंकली होती तसेच त्या निमित्ताने काहीसा दुर्लक्षित झालेला शिवमंदिर परिसर पुन्हा नव्याने उजळून निघाला होता. 

अंबरनाथचा काडेपेटी उद्योग :-

  अंबरनाथ म्हणले कि आणखी एका गोष्टीची आठवण होते, ती म्हणजे काडेपेटी. आता त्याची थोडी माहिती घेउया.
 ७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी ! इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का ? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९५ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी,चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं....
आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचिमध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात. आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे 'एम', 'आय नो ', 'होम लाईट','शिप' हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत.

संदर्भ :-

१) ठाणे जिल्हा गॅझेटीयर
२) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के.घाणेकर
३) www.durgbharari.in  हि वेबसाईट
४) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
५) http://sagarshivade07.blogspot.com
६) शेखर शिवदास ठाकरे tshekhars@gmail.com   + 974 - 555 765 11  
७) https://milindjournalist.blogspot.com/
८)  https://bijoor.me/2013/11/07/cycling-to-ambernath-shiva-ambreshwar-temple/
९)  राहुल रणसुभे, बीबीसी मराठी प्रतिनिधी
१०) http://myblogtshekhars-shivmandirambernath.blogspot.com/2016/08/blog-post.html
११) https://zerobeyond.com/ambernath-shiv-temple-india/
१२) www.survesagar.wordpress.com
१३)  

मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे. बाहेरील
बाजुस असलेली शिल्पे निवांतपणे पाहण्यासाठी किमान एक/दिड तास तरी अवश्य राखुन ठेवावा. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्‍यावरील भाव ठळकपणे दिसुन येतो. महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी उसळते. लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्र सरकारने २६ फेब्रुवारी १९९९ रोजी हे "तीर्थक्षेत्र" म्हणुन घोषित केले आहे. त्यामुळेच कि काय पण इतर तीर्थक्षेत्राजवळ आढळणारा गचाळपणा येथीही थोड्याफार प्रमाणात आढळतो.

सुदैवाने जागतिक पातळीवर या "शिल्पनक्षत्राची" नोंद घेतली आहे, पण आपण अजुनही याची खरी किंमत ओळखु शकलो नाही. ९५० वर्षे ऊन-वारा-पाऊस यांचे आघात सहन करत, आपले सौंदर्य जपत उभे असलेल्या ह्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देऊन त्याची शिल्पश्रीमंती अवश्य पहा. नाहीतर वेरूळ-अजिंठाशी नाते सांगणारे आणि मुंवई-पुण्यापासुन हाकेच्या अंतरावर असणारे हे भव्य शिल्प पहायला इतकी वर्षे का उशीर केला याची चुटपुट लागुन राहायची.
==================================================
==================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४
शिवलिंगाचे दर्शन घेण्याअगोदर या गणेशाचे दर्शन घ्यावे असा प्रघात आहे.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१

प्रचि ५२

प्रचि ५३

प्रचि ५४

प्रचि ५५

प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५८

 

 

 


I had to ask for directions to actually find the temple that is clustered in the middle of the town next to the Waldhuni river, which is a tributary to the Ulhas river that flows through Kalyan. I parked my cycle in one of the shops that provide flowers and other materials for devotees

As you enter the gates of the protecting wall around the temple complex, this intricately carved rock structure of the temple stands proudly in the center of the complex. The top dome of the temple seems to have been destroyed or disintegrated, but the rest of the temple seems to be remarkably in tact

This temple is built in around 1000 AD in the Vesara architecture style that combines two different styles. The northern style, technically called Nagara, is distinguished by the curvilinear towers. The southern style, known as the Dravida, has its towers in the form of truncated pyramids. The Vesara style combines both these styles and one can see both type of features

There are exquisite carvings both outside and inside the temple. The sculptures are all of Hindu mythological origin, predominantly in the Shiva theme. On the outside, there is a ring of sculptures at eye level all around the temple, while inside, there are sculptures on pillars, inner walls and the roof

The inner sanctum is located at a lower level inside the temple, and one has to climb down 20 steps to go down in the Garbhagriha – or interior of the sanctum sanatorium

Located in the center of the Garbhagriha is the “Swayambhu” or self-manifested Shiva Linga, and this is open to the sky, probably due to the top of the temple being destroyed or disintegrated. There was a stream of visitors who were busy praying and placing flowers, coconuts and other offerings to the Linga

There is also a small altar on the outside of the temple with the image of a six-armed Varahi. With the head of a sow, Varahi is the shakti (feminine energy, or sometimes, consort) of Varaha, the boar Avatar of the god Vishnu. She is depicted holding a danda (staff of punishment), khetaka (shield), khadga (sword), and pasha (noose) in four hands and the two remaining hands being held in Abhaya and Varada Mudra (“blessing gesture”). She also holds a shakti and hala (plough). She is depicted holding a child sitting on her lap

On the southern end of the temple complex, a small sanctorium holds the idol of Lord Ganesh, typically covered with vermillion paint. Behind this little sanatorium is a small ceremonial pond with the typical square boundaries

Flowing along the temple to the east is the Waldhuni river, also called Vadavan river that is one of the seven tributaries of the Ulhas river. Today, this river is quite narrow and not very clean. But along the banks I could see a lot of activity with women washing clothes and some kids having a blast dipping in the water

The temple complex is kept quite clean, and I saw some men dressed in the typical holy saffron clothes who seemed to be maintaining the complex regularly

It was almost noon and getting quite hot, and I had to cycle all the way back home. So I took one last look at the magnificent temple, collected my cycle from the shop, had a nice cool drink and headed off back the same way I came – enjoying the short off-road section




 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 अंबरनाथ येथील शिवमंदिर

 (ता. अंबरनाथ, जि. ठाणे) या मंदिराचे स्थापत्य वैशिष्टयाव्यतिरिक्तही अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर एक शिलालेख असून त्यात मंदिराचे बांधकाम ठाणे येथील शिलाहार राजा मुम्मुणिराज याच्या कारकिर्दीत शक संवत ९८२ (सन १० जुलै १०६०) रोजी पूर्ण झाले असा उल्लेख आहे. हा शक संवत्सराचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण भूमिज प्रकारातील सर्वात प्राचीन मानले जाणारे माळच्यातील उदसयपूर येथील उदयेश्वर मंदिर साधारणपणे यासच सुमारास, म्हणजे इ.स. १०६९ मध्ये बांधले गेले. मात्र त्या देवळातील पूजाअर्चा वगैरे धार्मिक विधींना सुरुवात इ.स..१०८० मध्ये झाली. त्यामुळे या दृष्टिकोनातून अंबरनाथ येथील शिवमंदिर उदयेश्वर मंदिरापेक्षा प्राचीन आहे असे वाटते.
   शिलालेखामध्ये मंदिराचा उल्लेख, "श्री अंबरनाथ देवकुल" असा करण्यात आला असून त्या मंदिरावररुनच या गावाला आणि पर्यायाने रेल्वे स्थानकाला "अंबरनाथ" हे नाव पडले. हे मंदिर मुंबई-पुणे लोहमार्गावरील अंबरनाथ स्थानकापासून दोन कि. मी. अंतरावर असून त्या भोवती त्याच काळात बांधलेली सीमाभिंत आहे. मंदिर पश्चिमाभिमुख असून दोन अर्धमंडप आणि एक मुखमंडप असलेला मंडप, त्याच्या मागे अंतराल आणि गर्भगृह असा त्याचा तलविन्यास आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याने या जागीच मंदिर उभारण्यात आल्यामुळे गर्भगृहाच्या जमिनीची पातळी मंदिराच्या अन्य भागातील जमिनीच्या पातळीपेक्षा बरीच खाली असून गर्भगृहात काही पायऱ्या उतरूनच प्रवेश करावा लागतो.
    शिल्पसंहितांनुसार भूमिज मदिरे पुढीलप्रमाणे तीन प्रकारची असतात चतुरस्त्र, वृत्तसंस्थानक आणि अष्टशाल हे तीन प्रकार होते. अष्टशाल या प्रकारात गर्भगृहाला आठ भद्र असतात. अंबरनाथ मंदिराचा तलविन्यास तारकाकृती आहे. मंडप आणि गर्भगृहाच्या बाहयरेषा एकमेकांना कोपऱ्यात छेदणाऱ्या चौरसासारख्या आहेत.
   मंदिर विस्तीर्ण पीठावर उभे आहे. सध्याच्या जमिनीच्या पातळीच्या वर कुंभ, अंतरपत्र, ग्रासपट्टी,गजथर आणि नरथर असे पीठाचे थर आहेत. त्यामुळे हे पीठ साध्या पीठापेक्षा अधिक अलंकृत आहे असे म्हणता येत. पीठाच्या विविध आडव्या थरांवर गुजरातमधील कलेचा प्रभाव दिसून येतो.
   पीठाच्या वर मंडोवर असून यात तवंगानी अलंकृत केलेला कुंभ भागाचा मधूनमधून देवमूर्ती असलेला पट्ट, अतरपत्र, कपोताली इत्यादी भाग आहे. त्यावर जंघा, उद्गम, भरणी, शिरावटी, मंचिका, कपोताली आणि छादय आहेत. त्यावर गर्भगृहावरील शिखराला सुरुवात होते.
   मंदिराला तलविन्यास आधीच नमूद केल्याप्रमाणे तारकाकृती आहे. त्याची परिणती गर्भगृह आणि मंडपाच्या बाह्यांगावर अंगे आणि सििललांतरे येण्यात झाली आहे. परिणामी पुढे आलेल्या स्तंभाच्या दोन उपलब्ध बाजूंवर मूर्तीची जोडी आहे आणि गर्भगृहाच्या तीन मुख्य भद्रांवर रथिका आहेत. भूमिज मंदिरांमध्ये सर्वच भद्र आणि अंगभागावर मूळ शिखराची प्रतिकृती असलेली लघुशिखरे असतात. त्यामुळे कपोतालीवर अशा लघुशिखरांची एक ओळच निर्माण होते आणि त्यातून प्रकाश आणि सावलीचा एक सुंदर आविष्कार तयार होतो. या मंदिरावरही अर्थातच ह्या छायाप्रकाशलीलेचे सुखद दर्शन घडते. हे शिवमंदिर असल्याने ह्या मंदिराच्या स्तंभाच्या बाह्यांगावरील मुख्य देव शिवपरिवारातीलच आहेत. अंतरालाच्या बाह्यांगावर गणेश आणि कार्तिकेय आहेत. गर्भगृहाच्या बाजूच्या दोन मद्रांवर महाकाली आणि गजासुरसंहारमूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागील बाजूच्या मद्रावर हरि-हर-पितामहार्क आहे.
   या मंदिरावर दाखविण्यात आलेली शिवाची उललेखनीय खरुपे म्हणजे मार्कडेयानुग्रह, कल्याणसुंदर आणि लिंगोद्भव शिव. विष्णूचे काही अवतार आणि रुपेही मंदिराच्यास भिंतीवर दाखविण्यात आली आहेत. मंदिराच्या कोणांवर दिक्पाल दाखविले आहेत. ब्रह्मदेवाला या मंदिरात विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मंडपाच्या इशान्य कोपऱ्यात ब्रह्मदेवाचे एक लहानसे मंदिर आहे.
   मंदिराच्या मंडपात चौरस रंगशिला असून त्यावर चतुष्की आहे. या चार स्तंभांवर घुमटाकार छत पेलले आहे. या छताच्या खालच्या भागापासून उत्तरोत्तर लहान होत जाणारी वर्तुळे आहेत. सर्वात वर कमळाचा आकार कोरला आहे. त्यामुळे हे घुमटाकार छत उलटया कमलपुष्पासारखे भासते. मात्र चतुष्कीच्या चार बाजूंच्या चार भागांवर मात्र बाह्य भागाकडे निमुळती होत जाणारी छते आहेत. ही छते रंगशिलेवरील छताच्या तुलनेत कमी अलंकृतआहेत. मंडपातील आणि अर्धमंडपातील स्तंभही उल्लेखनीय  आहेत. हया दोन प्रकारच्या स्तंभांवर येणारे घटक आणि त्यांचा क्रम सारखाच आहे. हे स्तंभ गुजरातमधील त्याच काळात बांधल्या गेलेल्या सोळंकी मंदिरांमधील स्तंभाशी मिळतेजुळते आहेत. या स्तंभांचे तळखडे चौरस असून त्यावर तीन अष्टकोनी घटक, त्यावर वर्तुळाकार घटक, वर पीठाकृती शीर्ष आणि त्यावर कीचकहस्त आहेत. स्तंभांमधील खांब आणि अष्टकोनी घटकही पुराणाकथांशी संबंधित असलेल्या
मूर्तिशिल्पांनी युक्त आहेत. अर्धमंडपातील स्तंभांवर मात्र कीचकहस्तांऐवजी साधे नागशीर्ष हस्त आहेत.
   अंबरनाथ हे जरी महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन भूमिज मदिर असले तरी या मंदिराला त्याची स्वतःची अशी खास वैशिष्टये आहेत. या वैशिष्टयांमुळे ते माळव्यातील उदयेश्वर मंदिरासारख्या सर्वसाधारण भूमिज मंदिरापेक्ष काही अंशी भिन्न आहे. मंदिराचा तलविन्यास सप्तरथ असून त्याचे शिखर सात मजली आहे (सप्तभूम भूमिज प्रासाद). हया भूमी किंवा मजले बहुतेकवेळा मुख्य शिखरावरील उत्सेधात्मक सात शिखरप्रतिकृतींनी म्हणजे एकावर एक अशा सात प्रतिकृतींच्या रांगांनी सूचित केले जातात. या शिखर प्रतिकृतींच्या रांगा मुख्य शिखरावरील चार लतांच्या मधल्या भागात असतात. या चार मुख्य दिशांना असणाऱ्या लता चैतयगवाक्ष-प्रयोजनांनी अलंकृत केल्या जातात. अंबरनाथ मंदिरावर असलेल्या शिखरप्रतिकृती मात्र मुख्य शिखराच्या प्रतिकृती नाहीत. त्या दाक्षिणात्य (द्राविड) पद्धतीची शाला शिखरे आहेत. त्यांना शिल्पशास्त्रांच्या तांत्रिक भाषेत स्तंभकूट संबोधले जाते. मंडपावर चौकोनी, शंक्वाकृती शिखराऐवजी घंटासंवरण प्रकारचे शिखर आहे. शिल्प संहितांमध्ये "द्राविडकर्म" या प्रकारचे वास्तु-अलंकरण सांगितले आहे. कृष्ण देवांच्या मते अशा प्रकारच्या शिखर-रचना करणे म्हणजेच द्राविडकर्म असावे. तसे असल्यास अंबरनाथचे मंदिर या प्रकारचे अलंकरण असलेले महाराष्ट्रातील पहिले मंदिर होय.
 
 
 
 
 
 
 
 
 
अंबरनाथचं शिवमंदिर, (जि. ठाणे)
मुंबईच्या धकाधकीच्या मागल्यात लोकल प्रवासातील एका स्टेशनचं नाह या पलीकडे अंबरनाथची कोणाला माहिती नसते, काड्यापेटांचा कारखाना आणि बोर अभ्यासक-संग्राहक-संशोधक श्री. वसंतराव कर्णिक यांचा परिचय काही जणांना असतो, पण याच उद्योगी उपनगरात हळेबीड-बेलूरचं स्मरण करून देण्याचे सामर्थ्य असणारं एक शिव मंदिर आहे याचा पत्ताच नसतो. आवर्जून पहावं असंच हे आगळे वेगळे शिवमंदिर आहे. खरंतर या अमरनाथ मुळेच या गावाचं नाव अंबरनाथ झाले.
अकराव्या शतकातील शिल्पसमृद्ध मंदिर -
वालधुनी उर्फ बढवाण नदीच्या एका उपनदीवर (ओढघावर) ऐन काठाशी हे मंदिर आहे. एकेकाळी आंबा अन् चिंचेच्या दाट राईत हे मंदिर होतं. आता मोहमयी मायानगरी मुंबईच्या विळख्यात सापडल्याने झोपडपट्टीच्या पाऊलखुणा इर्ष उमटू लागल्या आहेत. खरं तर हा सारा परिसरच संरक्षित करून, त्याचं सौंदर्य वाढविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत,
शिलाहार राजा छित्तराजाने येथे मूळमंदिर बांधले. पण त्याचा मुलगा मुम्मुणी किंवा ममवानी याने त्याचा जीर्णोद्धार केला अशी नोंद तेथील इ.स. १०१० मधील शिलालेखातच मिळते. मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वाराजवळ महामंडलेश्वर मुम्गुणीचा हा शिलालेख सहज वाचता येतो. रॉयल एशियाटीक सोसायटीच्या जर्नलमध्ये खंड ९वा, पृष्ठ २१९ आणि खंड १२वा, पृष्ठ ३२९ मध्ये हा शिलालेख प्रसिद्ध झाला आहे.
सध्या मंदिराला कळस नाही. पण प्रख्यात संशोधक बर्जेस (बर्गेस) याने कळसाचे काही भग्नावशेष आढळले होते अशी नोंद केलेली आढळते. मुख्य वार पश्चिमाभिमुख आहे. आणखीही दोन दारे आहेतच. या मुख्य दरवाजाशी दोन नंदी आहे. पैकी प्राचीन नंदीच्या गळयात शिवलिंग आहे.
या मंदिराची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गाभारा आणि सभामंडप है दोन अनुक्रमे छोटे व भोठे चौरस एकमेकांना कोपऱ्यात चिकटले आहेत. पण प्रत्यक्ष संयोगस्थानी तेथे भिंत बांधल्याने कोपरे एकमेकात विलीन झाले आहेत. देवालयाचा प्राकार पूर्व पश्चिम ५० मीटर अन् दक्षिणोत्तर ३५ मीटर होता. तर आतील मंदिर १९ मी/७९ फूट x २४ गी/७३.५ फूट आहे. सध्या मंदिराची उंची जवळजवळ
    २१ मी. आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरलं की, अठरा खांबांच्या भव्य सभामंडपात्त प्रवेश होतो. सध्या त्यातील चारच स्पष्ट दिसतात. उरलेले चौदा, आधार-भिंतींमध्ये बुजवले गेले आहेत. तसूभरही जागा न सोडता बारीक नकसकामाने हे सारे खांब मढवून टाकले गेले आहेत. सभामंडपाचे छत व कळस यामधील भाग पोकळ आहे. दक्षिण दरवाज्याजवळ वरच्या बाजूस असणाऱ्या झरोक्यातून त्यात जाता येते. किंवा बाहेरच्या बाजूने उत्तरबाजूकडून वर चढून जाता येते. सभामंडप व गाभाऱ्याची बाहेरची बाजू बहुकोनयुक्त आहे. त्यामुळे तेथील छाया-प्रकाशाचा खेळ वेधक ठरतो. आणि त्यातच ठोकळेबाज चौकोनीपणा केव्हाच लपून जातो.
मंदिराच्या बाह्यांगाचे शिल्पकाम गेल्या हजार वर्षात उन-पावसाचे तडाखे खाऊन बरेच झिजून गेले आहे. सध्या तर प्रदुषणामुळे त्यास अधिक वेगाने ठिसूळपणा येऊ लागला आहे. संपूर्ण मंदिर सव्वादोनशे कोरीव हत्तींच्या पाठीवर तोलून धरलेले आढळते. हा गजथर सर्वात खालच्या बाजूला आहे. त्यानंतरच्या घरात जवळजवळ सत्तर मूर्ती दृष्टीच्या टप्प्यात आहेत. पण तिथवर सहजी हात पोहोचणार नाही इतपत उंचीवर त्या खोदल्या आहेत.
पश्चिमद्वारातून बाहेर पडून मंदिर प्रदक्षिणा सुरू केली की, पहिल्याच कोनात दीड मीटर उंचीवर उजव्या सोंडेचा गणपती आहे. त्यानंतरच्या कोनात आपल्याकडे न बघता दुसरीकडे पहाणारा पुरुष पाहून आश्चर्यचकीत झालेली स्त्री उजवा हात अचंब्याने तोंडाकडे घेऊन उभी असलेली कोरलेली आहे. त्यानंतरच्या कोनात त्रिशूल घेतलेली शिवमूर्ती आहे. नंतरच्या कोनात अतिशय प्रमाणबद्ध अशी लंगोटीधारी व कमंडलू घेतलेल्या दाढी वाढवलेल्या गोसाव्याची आकृती कोरलेली आहे. त्या मागच्या कोनात लक्ष्मीची मूर्ती आहे. पण तिच्याकडे पाठ फिरवून पुढच्या कोनात असणाऱ्या विष्णूकडे जाण्याचा अविर्भाव या बैराग्याच्या शिल्पात उतरला आहे. ऐहिक वैभव लाथाडून चिरंतन-शाश्वत मोक्षाकडे जाण्याचा उपदेश तर यातून सूचित करावयाचा नसेल ना ?
उत्तरद्वारानंतर जमिनीलगत एक देवळासारखी खोली आहे. त्यात शिवलिंग, पर्वताकार पाषाण व पार्वतीची मूर्ती आहे. मूळ मंदिरानंतर हे बांधकाम केल्याचे जाणवते. यानंतर गाभाऱ्यातील अभिषेक जल वाहून आणून कुंडात सोडले आहे. तेथून वाट काढून ते नदीत नेऊन सोडले आहे.
कुंडाच्यावर त्रिमूर्ती शिव कोरलेला आढळतो. शिवाच्या डाव्या अंकावर पार्वती बसलेली आहे. (काही तज्ञांच्या मते हे शिल्प त्रिमुखी ब्रह्मा व पत्नी
    सावित्रीचं आहे.) तर वरच्या कोनाड्यात नरमुंडधारी महाकाली कारलेली आहे. कृश शरीराच्या या महाकालीची हाडे देखील दिसतात. कृश स्तन लोंबणारी, वाळलेले हातपाय असणारी ही मूर्ती आहे. गळ्यात मानवी शिरांची माळ आहे. तर कमरेला सर्पमेखला आहे. वरच्या उभट पट्टधात चंद्रकोरीत नटराजाची मूर्ती आहे.
नंतरच्या कोनात शिवपार्वती विवाह सोहळा दाखवला आहे. यातील महादेवाच्या हातात त्रिशूळ आहे. यानंतरच्या कोनात एक प्रकाश स्तंभ रूपी शिव आणि हंसारूढ ब्रह्मदेव व वराहरूपी विष्णू दाखविले आहेत.
दक्षिण दरवाज्याजवळील कोनात कानावर हात ठेऊन लगट करणाऱ्या स्त्रीला टाळून पुढे असणाऱ्या तरूणीकडे जाणारा साधू कोरला आहे. दक्षिण दारालगतच शेंदूर चर्चित गणपतीची मूर्ती आहे.
चौरीधारी शालभंजिका, आरसा घेतलेल्या शालभंजिका, लज्जावती, नृत्यांगना, कच्छमुक्ता, वृक्षदेवता, द्वारपाल, मिथुनशिल्पे, आठ हातांचा कामदेव, चार हातांचा विष्णू, महिषासुरमर्दिनी, त्रिमुखी ब्रह्मा, मोहिनी, गणपती, कार्तिकेय अशा इतरही अनेक उल्लेखनीय मूर्ती आहेत. यांचे अविर्भाव, झोक, डौल, वेशभूषा, दागदागिने, शस्त्रे अतिशय सुबकपणे कोरली आहेत. पण गेल्या हजार वर्षात झालेल्या पाऊसपाण्याच्या माऱ्याने त्यांचे तपशील नष्ट होऊ लागले आहेत.
याशिवाय मंदिराच्याच बाह्यांगावर सुमारे पावणेदोन मीटर उंचीवर एक लहानशी पट्टी कोरलेली आहे. त्यामध्ये शृंगारिक कामशिल्पे, संभोग शिल्पे व कामक्रिडा करणाऱ्या अनेक आकृती कोरलेल्या आहेत. पण त्यातील बऱ्याच झिजून गेल्या आहेत.
गर्भगृह -
गाभाऱ्याच्या गणेश पट्टीत योगी शिव कोरलेला आहे. त्यावर सकाळी १० ते दुपारी ४ उजेड असतो, तेव्हा हे शिल्प लक्षात येते. एरवी अंधारच आहे. प्रत्यक्ष गाभारा सभामंडपाच्या पातळी खाली जवळजवळ सव्वादोन मीटर आहे. तेथवर जायला डझनभर पायऱ्या आहेत. प्रत्यक्ष गाभाऱ्याचे आता कठडा घालून दोन भाग केले आहेत. गाभाऱ्यात उत्तराभिमुखी दोन शिवलिंगे आहेत. पैकी प्राचीन शिवलिंग काळ्या पाषाणाचे आणि स्वयंभू आहे. दुसरे गारगोटीचे घडीव आहे. हा गाभारा दगडी चिरे लावून बंद करण्याची काही व्यवस्था असावी अशा खुणा कोपऱ्यांवर आढळतात. गाभाऱ्याच्या भिंती अडीच मीटर जाडीच्या आहेत. तर उंची जवळपास २१ मीटर आहे.
    गुजरात येथील मोढ्याच्या सूर्य मंदिरात आणि काठेवाड्यातील पट्ट्यांच्या सोमनाथ मंदिरात असा गाभार बंद करण्याची सुविधा आढळते या सर्व मंदिराच्या उभारणीच्या काळातच मूर्तीभंजक, आक्रमक, धर्माध मुसलमानांच्या स्वाऱ्या सुरु झाल्या. त्याचा हा परिणाम असावा.
मंदिराच्या सभामंडपात कोरलेले खांब म्हणजे अतिशय आकर्षक ठेवा आहे. अबूच्या विमलसा मंदिरातील स्तंभांचीच त्यामुळे आठवण होते. याशिवाय पश्चिम व दक्षिणेच्या दारांजवळच्या मुखमंडपांजवळ दुसऱ्या तन्हेचे अन् उतरेच्या मुखमंडपाजवळ तिसऱ्या तन्हेचे स्तंभ आहेत. खरं तर पूर्वी हे सारखेच असावेत कारण शेजारच्या अर्ध स्तंभांप्रमाणे रचना असणारे मूळ खांब असावेत. नंतर काही कारणाने बदलते वेळी चौकोनातून गोलाकारात रुपांतर होणाऱ्या खांबांऐवजी पूर्ण चौकोनी असणारे खांब बसविले गेले असावेत.
सभामंडपाच्या मधल्या चार खांबांवर तोलल्या गेलेल्या मुख्य छतात एकामध्ये एक असणारी वर्तुळे व मध्यभागी एक झुंबर आहे. मध्यवर्ती घुमटाला पूरक असे उपघुमट, कोरीव बहाले, किर्तीमुखे असेही बरंच काही नकसकाम आवर्जून पहावे असे आहे. भिंतीवरही थोड्याफार मूर्ती आहेतच. पण आवर्जून उल्लेख करावा अशा थोड्याच.
खरं तर गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर असणारं, बाहेरच्या बाजूचं शिल्प, मूळ मंदिर कोणाचं असावं? याची कल्पना देते. या मंदिरात त्याजागी आठ हाताची उभी त्रिमूर्ती आहे. वरच्या डाव्या हातात साप घरलेला आहे. तेवढाच शाबूत आहे. उरलेले भम केले गेले आहेत. त्यावरुन ठाम निर्णय घेता येणं कठीण आहे.
शिलाहार राजवंश -
याच ठिकाणी शिलाहारांबद्दल थोडीफार माहिती दिली, तर ती अस्थानी होणार नाही. मूळच्या प्रबळ अशा शिलाहारांच्या पुढे तीन शाखा झाल्या.
सुवर्ण गरुडध्वजधारी उत्तर कोकणचे शिलाहार बहुदा राष्ट्रकूट व चालुक्यांचे सामंत असावेत. अमरनाथ (आम्रनाथ?) मंदिर उभारणारा मुम्मुणी शिलाहार हा चालुक्य राजवंशातील पहिल्या सोमेश्वराचा समकालीन व मांडलिक असावा. या शिलाहारांना "तगरपुर परमेश्वर" असा किताब होता. उरलेल्या शिलाहारांचे राज्य दक्षिण कोकण व कराड-कोल्हापूर भागात होते.
काही विचार -
केंद्रिय शासनाकडील पुरातत्व खात्याकडे हिंदुस्थानातील बहुतेक महत्वाची ठिकाणे आहेत. अंबरनाथ सारखी मंदिरं, अजिंठा-वेरूळ सारखी लेणी,
 शिवनेरी-रायगड सारखे किल्ले उपेक्षित रहातात. नटवले जात नाहीत. पण तेत्र खाते औरंगाबाद मधील कोण्या एका बेगमेचं थडगं सुशोभित राखण्यास हजारो रुपये खर्च करते. हा काय प्रकार आहे? उत्तरेच्या ताजमहालच्या थडग्यात जाताना हे खाते पादत्राणे उतरवणे आवश्यक मानते अन् आमच्या वेरूळ / कैलास लेण्यातील श्रीमाणकेश्वर महादेवाच्या गाभाऱ्यात सर्वांना पादत्राणे घालून वावरू देते ? याची चीड आम्हाला येत नाही, आमचे निर्लज्ज लोक प्रतिनिधी सत्तेच्या खुर्चीसाठी वाटेल ते करतील, पण अशा राष्ट्रीय महत्वाच्या प्राचीन ठेव्यांसाठी आणखी पैसे खर्च करायला केंद्रशासनाला भाग पाडत नाहीत. तिकडे धर्मवेड्या टिपूचं घडो अलिशान-ए-मंझील अन् युगपुरुष-राष्ट्रनेत्या शिवछत्रपतींचं रायगडावरचं पुण्यस्थळ ? याची लाज वाटेल, चीड येईल असा एकही लोकनेता उभ्या महाराष्ट्रात असू नये. एका छळीष्ट, धर्माध धर्मउपदेशकाचं प्रेत कवटाळणारं गिरीजाधर गोव्यात लाखो रुपये खर्चुन टिकवले जाते आणि आमचा हा अंबरनाथ अशा उकिरडयाचा धनी होतो ?
  हे कधी बदलेल का ? तशी सुबुध्दी आमच्या राज्यकर्त्यांना कधी सुचेल का ? ह्या राष्ट्रीय सांस्कृतिक ठेव्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधायला आमची मुंबापुरी किंवा जळगाव ते बेळगाव अन् चांदा ते बांदा पसरलेला महाराष्ट्र लाक्षणिक बंद पाळील का ?
खरं तर ही अशी प्राचीन, स्फूर्तीदायक, आगळीवेगळी सारीच ठिकाणं एखाद्या दिवशी बुलडोझर लावून जमीनदोस्त करावीत म्हणजे एकाच दिवशी पोटभर रहून घेता येईल. उगीच रोज मुसमुसत तरी बसावं लागणार नाही. बा, महाराष्ट्रा, तुझं रक्षण कदाचित फक्त परमेश्वरच करू शकेल












 अंबरनाथ येथील शिवमंदिर

 या मंदिराची स्थापत वैशिष्ट्ये व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर एक शिलालेख असून त्यात मंदिराचे बांधकाम ठाणे येथील शिलाहार राजा मुंबई राज यांच्या कारकिर्दीत शक संवत  982 सन 10 जुलै 660 रोजी पूर्ण झाले असा उल्लेख आहे. हा शकसंस्थाचा उल्लेख अत्यंत महत्त्वाचा आहे कारण भूमीच प्रकारातील सर्वात प्राचीन मानले जाणारे माळव्यातील उदसयपूर येथील उदयेश्वर मंदिर साधारणपणे याच सुमारास म्हणजेच इस 1069 मध्ये बनले गेले. मात्र त्या देवळातील पूजा अर्चा वगैरे धार्मिक विधीना सुरुवात इस 1080 मध्ये झाली. त्यामुळे या दृष्टिकोनातून अंबरनाथ येथील शिवमंदिर उतेश्वर मंदिरापेक्षा प्राचीन आहे असे वाटते.
 शिलालेखामध्ये मंदिराचा उल्लेख श्री अंबरनाथ देवकुल असा करण्यात आला असून त्या मंदिरावरूनच या गावाला आणि पर्यायाने रेल्वे स्थानकाला अंबरनाथ हे नाव पडले. हे मंदिर मुंबई पुणे लोहमार्गावरील अंबरनाथ स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर असून त्याभोवती त्याच काळात बांधलेली सीमा भिंत आहे. मंदिर पश्चिमा भीम का असून दोन अर्धमंडप एकमुख मंडप असलेला मंडप आणि त्याच्यामागे अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. येथे स्वयंभू शिवलिंग असल्याने या जागीच मंदिर उभारण्यात आल्यामुळे गर्भगृहाच्या जमिनीची पातळी मंदिराच्या अन्य भागातील जमिनीच्या पातळीपेक्षा बरीच खाली असून गर्भगृहात काही पायऱ्या उतरूनच प्रवेश करावा लागतो.
 शिल्प संहिता नुसार भूमीच मंदिरे पुढील प्रमाणे तीन प्रकारचे असतात. चतुरस्त्र वृत्तसंस्था नक आणि अष्टशाल हे तीन प्रकार होत. अष्टशाल या प्रकारात गर्भगृहाला आठभद्र असतात अंबरनाथ मंदिराचा तलविण्यास तारखाकृती आहे मंडळ आणि गर्भगृहाची बाह्य रेषा एकमेकांना कोपऱ्यात येणाऱ्या चौरसासारख्या आहेत. मंदिर विस्तीर्ण पेठावर उभे आहे सध्याच्या जमिनीच्या पातळीच्या वर कुंभ अंतरपत्री ग्रास पट्टी गज थर आणि नरथर असे पिठाचे थर आहेत. त्यामुळे हे पीठ साध्या पिठापेक्षा अधिक अलंकृत आहे असे म्हणता येईल. पिठाच्या विविध आडव्या थळांवर गुजरात मधील करण्याचा प्रभाव दिसून येतो.
   पिठाच्या वर मंडोवर असून यात तवंग तवंग आम्ही अलंकृत केलेला कुंभ भागाचा मधून मधून देव मूर्ती असलेला पट्टा अंतर पत्र कपूताली इत्यादी भाग आहेत. त्यावर गंगाउटगम भरणे शिरावटी मंचिका कपूर ताली आणि छाद्य आहेत. त्यावर गर्भगृहावरील शिखराला सुरुवात होते.
 मंदिराला तलविण्यास आधीच नमूद केल्याप्रमाणे तारकाकृती आहे. त्याची प्रणती गर्भ ग्रह आणि मंडपाच्या बाह्य अंगावर अंगे आणि संविधान तरावर येण्यात झाली आहे. परिणामी पुढे आलेल्या स्तंभाच्या दोन उपलब्ध बाजूंवर मूर्तीची जोडी आहे. आणि गर्भगृहाच्या तीन मुख्य बदलांवर प्रतीक आहेत. भूमीच मंदिरांमध्ये सर्वच भद्र आणि अंगभागावर मूळ शिखराची प्रतिकृती असलेले लघुशिखरे असतात. त्यामुळे कपवतालीवर अशा लघुशीकरांची एक ओळख निर्माण होते. आणि त्यातून प्रकाश आणि सावलीचा एक सुंदर अविष्कार तयार होतो. या मंदिरावरील अर्थातच या छायाप्रकाश लिहिल्याचे सुखद दर्शन घडते. हे शिवमंदिर असल्याने या मंदिराच्या स्तंभाच्या भयंगावरील मुख्य देव शिव परिवारातीलच आहेत. अंतराळाच्या बाह्य अंगावर गणेश आणि कार्तिकीय आहेत. गर्भाच्या बाजूच्या दोन बाजारांवर महाकाली आणि गजासूर सहारा मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागील बाजूच्या भद्रावर हरिहर पितामहर्क आहे.
 या मंदिरावर दाखवण्यात आलेली शिवाची उल्लेखनीय स्वरूपे म्हणजे मार्कंडेयानोग्रह, कल्याण सुंदर आणि लिंगोत बहुतेक. विष्णूचे काही अवतार आणि रूपे ही मंदिराच्या भिंतीवर दाखवण्यात आली आहेत. मंदिराच्या कोणावर दिपाल दाखवले आहेत. ब्रह्मदेवाला या मंदिरात विशेष महत्त्व देण्यात आले आहे मंडपाच्या ईशान्य कोपरात ब्रह्मदेवाचे एक लहानसे मंदिर आहे.
 मंदिराच्या मंडपात चौरस रंगशील असून त्यावरच्या दृष्टी आहे. या चार स्तंभांवर गुंठाकार छत पिल्ले आहे या छताच्या खालच्या भागापासून उत्तरोत्तर लहान होत जाणारे वर्तुळे आहेत. सर्वात वर कमळाचा आकार कोरलेला आहे. त्यामुळे हे गुंठा का छत उलट्या कमल पुष्पा सारखे भासते. मात्र चतुकीच्या चार बाजूंच्या चार भागांवर मात्र बाह्य भागाकडे निमुळते होत जाणारे छते आहेत. हीच रंगश्रियांच्या छताच्या तुलनेत कमी शिल्प असलेली आहेत. मंडपातील आणि अर्ध मंडपातील स्तंभ हे उल्लेखनीय आहेत. या दोन प्रकारच्या स्तंभावर येणारे घटक आणि त्यांचा क्रम सारखाच आहे. हे संभा गुजरात मधील त्याच काळात बांधला गेलेल्या सोळंकी मंदिरामधील स्तंभाशी मिळते जुळते आहेत. या संभाजी तळकडे चौरस असून त्यावर तीन अष्टकोनी घटक त्यावर वर्तुळाकार घटक वर पेठाकृती शीर्ष आणि त्यावर कीचक हस्त आहेत. स्तंभा मधील खांब आणि अष्टकोनी घटकही पुरांकथांशी संबंधित असलेल्या मूर्ती शिल्पाने युक्त आहेत. अर्ध मंडपातील स्तंभावर मात्र कीचक हस्तांच्या ऐवजी साधे नाग शीर्ष हस्त आहेत.
 अंबरनाथ हे जरी महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन भूमीच मंदिर असले तरी या मंदिराला त्याची स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. या वैशिष्ट्यामुळे ते माळव्यातील उधेश्वर मंदिरासारख्या सर्वसाधारण भूमीच मंदिरा पेक्षाही काही अंशी भिन्न आहे. मंदिरात मंदिराचा तलवारींना सप्तरत असून त्याच्या शिखर सात मजली आहे. सप्त भूम भूमीस प्रसाद. या भूमी समजले बहुतेक वेळा मुख्य शिखरावरील उस्सेघात्मक साथ शिखर प्रतिकृतीने म्हणजे एकावर एक अशा सात प्रतिकृतींच्या रांगांनी सुचित केले जातात. या शिखर प्रतिक्रियांच्या रांगा मुख्य शिखरावरील चार लतांच्या मधल्या भागात असतात. या चार मुख्य दिशांना असणाऱ्या लता चैत्यगवाक्ष प्रयोजन आणि अलंकृत केल्या जातात. अमरनाथ मंदिरावर असलेल्या शिखर प्रतिकृती मात्र मुख्य शिखराच्या प्रतिकृती नाहीत. त्या दक्षिणात्य द्रविड पद्धतीची शाळा शिखरे आहेत. त्यांना शिल्पशास्त्राच्या तांत्रिक भाषेमध्ये स्तंभ कुठे संबोधले जाते. मंडपावर चौकोनी शंकाकृती शिखराच्या ऐवजी घंटा संवर्धन प्रकारचे शिखर आहे. शिल्पसंहितामध्ये द्रविड कर्म या प्रकारचे वास्तू अलंकारण सांगितले आहे. कृष्ण देवांच्या मते अशा प्रकारच्या शिखरचना करणे म्हणजेच द्रविड कर्म असावे. तसे असल्यास अंबरनाथचे मंदिर या प्रकारचे अलंकरण असलेले महाराष्ट्रातील पहिले मंदिर होय



अंबरनाथ.... मध्य रेल्वेच्या मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील एक रेल्वे स्टेशन. परंतु प्राचीन काळापासून अंबरनाथची खरी ओळख आहे ती येथील शिलाहार राजांनी बांधलेल्या पुरातन शिवमंदिरामुळे. अंबरनाथचे हे प्रख्यात शिवमंदिर या प्रदेशावर शैवपंथीय शिलाहारांच्या सत्ताकाळात बांधले गेले. आपल्या राजसत्ताकाळात त्यांनी आपल्या प्रदेशात १२ अप्रतिम कलाकृतीची शिवमंदिरं बांधली त्यातील अंबरनाथचे शिवमंदिर आजही आपलं अस्तित्व टिकवून आहे. मंदिरात विविध प्रकारच्या लहानमोठय़ा अशा हजारो मूर्ती असून शिल्पकला आणि वास्तुकला यांचा सुरेख संगम या मंदिरात पहायला मिळतो. मंदिरातील शिवलिंग अंबरेश्वर म्हणुन ओळखले जाते आणि या नावावरून या शहराला अंबरनाथ हे नाव पडल्याचे सांगितले जाते. रेल्वे स्टेशनपासुन साधारण दोन कि.मी अंतरावर वालधुनी नदीकाठी हे प्राचीन शिवमंदिर आहे. रेल्वे स्टेशनपासून चालत गेल्यास २०-२५ मिनीटात तर रिक्षाने १० मिनीटात आपण मंदिर परिसरात पोहचतो. खडकात भव्य प्राकार खोदून त्या प्राकारात जमिनीच्या पातळीवर हे मंदिर उभारले आहे. मंदिराभोवतालची प्राकार भिंत कालौघात नष्ट झाले असुन मंदिर परीसरात कोसळलेल्या भागांचे अवशेष दिसुन येतात. मंदिराच्या प्रांगणातच एक बांधीव तळे असुन या तळ्यात दोन बाजूंनी उतरणाऱ्या पायऱ्यांच्या कोपऱ्यात कोरीव मुर्ती दिसुन येतात. दुसरा मोठा तलाव मंदिराच्या पुर्व बाजुला असुन हा बहुधा नंतरच्या काळात बांधला गेला असावा. मंदिराची रचना पश्चिमाभिमुख असुन मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला तर उत्तर व दक्षिण बाजूस दोन प्रवेशद्वारे आहेत. शिल्पशास्त्राप्रमाणे हे शिवमंदिर सप्तांग भूमीज पद्धतीत बांधलेले असुन मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. गाभाऱ्यायावरील कळस नष्ट झाल्याने पूर्वी एकावर एक अशा रचलेल्या शिल्परांगातील तीनच शिल्परांगा शिल्लक आहेत. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत सौंदर्याने नटलेले आहे. सध्या असलेले मंदिर गर्भगृह आणि सभामंडप दोन भागात विभागले आहे. मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ अलीकडच्या काळातील दोन नंदी आहेत. यातील एका नंदीच्या गळयात शिवलिंग आहे. मंदिराचे प्रवेशदाराजवळ शिलालेख असल्याचे वाचनात येते पण आता मात्र तो तेथे व मंदीर परीसरात नाही. एशियाटीक सोसायटीच्या एका खंडात हा इ.स.१०६०चा शिलालेख छापला असुन त्याच्या वाचनानुसार शिलाहार राजा छित्तराज याने इ.स. १०२० मध्ये मंदीर बांधण्यास प्रारंभ केला व त्याचा मुलगा मुण्मणि याच्या कारकीर्दीत श्रवण शुध्द ९ शके ९८२ म्हणजेच २७ जुलै १०६० रोजी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. आत शिरल्यावर अठरा खांबांचा भव्य सभामंडप दिसतो त्यातले चार खांब विलग असुन बाकीचे खांब भिंतीलगत आहेत. सभामंडपातील हे खांब कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुना आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत असुन छताच्या मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वर्तुळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या असुन तळात किर्तीमुख कोरले आहेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत सुंदर अशा प्रतिमा कोरल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख कामदेवाची अष्टभुजा मूर्ती आहे. कामदेवाच्या मुर्तीची एकूणच कमनीयता, अलंकार स्पष्ट आणि नाजुकतेने कोरले आहेत. मंदिरात तीन तोंडे असणारी एक त्रिमुखी मूर्ती आहे. हे बहुधा शंकर पार्वतीचे शिल्प असावे कारण मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. गर्भगृह हे सभामंडपापेक्षा आठ फुट खाली असुन आत उतरण्यासाठी बारा पायऱ्या आहेत. मूळ मंदिरात शिवलिंग नसल्याने अलीकडच्या काळात गाभाऱ्यात दोन शिवलिंग स्थापित करण्यात आली आहेत. गाभाऱ्यात शिवलिंगाऐवजी एक उंचवटा आहे यालाच स्वयंभू शिवलिंग मानून त्याची पूजा केली जाते. गाभाऱ्याच्या वरील शिखर कोसळलेले असल्याने तेथुन वर पाहिले असता शिखराच्या अंतर्गत भागाचे अवशेष दिसतात व विवरातून आकाशदर्शन होते. गाभाऱ्याच्या तळापासून शिखराची उंची साधारण ४० फुट आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते. मंदिराच्या तळखड्यात अनेक हत्ती कोरलेले असुन जणू काही हत्तींच्या पाठीवरच हे मंदिर वसले आहे. मंदिराच्या बाह्यांगावर अनेक देवदेवतांची शिल्पे कोरली आहेत. शिवाच्या जीवनाशी निगडीत असे ठळक प्रसंग या मंदिरातील कोरीव कामातून दिसतात. या शिल्पांमध्ये विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, शृगांरिक कामशिल्पे, गरुडारूढ विष्णू, विवाहपुर्व शोडषवर्षीय पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरासुर वधमूर्ती, नृत्यांगना, द्वारपाल, नटराज, नरमुंडधारी महाकाली, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवतार मूर्ती, महिषासुरमर्दिनी, हंसारुढ ब्रम्हदेव या मूर्ती अत्यंत कुशलतेने कोरल्या आहेत. दगडात कोरलेल्या या मुर्तीतून त्या काळची आभूषणे आणि वेशभूषा साकारलेल्या आहेत. मात्र त्यातील अनेक मुर्तीची काळाच्या ओघात झीज झाली आहेत. मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे पण ते मूळ मंदिराच्या कामाशी विसंगत असुन कदाचित नंतरच्या काळात केले गेले असावे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यातील अभिषेकजल प्रथम कुंडात आणि नंतर ओढय़ात सोडण्याची व्यवस्था या मंदिर बांधकामात आहे. मुंबईपासून जवळ असलेल हे शिवमंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असुन या मंदिरास भेट द्यायलाच हवी. मंदिराचा ताबा पुरातत्व खात्याकडे असुन पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
© Suresh Nimbalkar




अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)





मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.

मंदिराचे बांधकाम साधारण शके ९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली आहे. 

 

काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्तीशिवलिंगशंकराची मूर्ती ,पार्वतीनरमुंडधारी महाकालीशंकर पार्वती विवाहहंसा वर आरूढ ब्रम्हदेववराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपतीत्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही  शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे. 




मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.


मंदिराचे कोरीव काम हे खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे.  हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता येते.  दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात . 


मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.

मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो.  अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.

इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते

अम्बरेश्वर मंदिर गुगल नकाश्यावर : -













उध्वस्त कळसात मुकं शिल्प बोलकी करण्याचा प्रयत्न करत आहे….
          मंदिर शैलीचा आणि विविध शिल्पांचा अभ्यास करताना जुन्या मंदिरांचे माझ्या मनात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. देव देवळात तर आहेच पण बारकाईने आणि अभ्यासू दृष्टिकोनातून पाहिल्यास देव शिल्पांमध्ये व ते कोरणाऱ्याच्या हातांमध्ये दिसून येतो. असेच एक उध्वस्त कळसाचे मंदिर मध्य रेल्वेचे स्थानक अंबरनाथ जवळ आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याचाकडे पाहता येते. ऑफिसला जाताना मला रोज ह्याच स्थानकाला पार करून जावे लागते पण तिथे कधी जाण्याचा योग आला नव्हता तो काल आला. तसं पाहिलं तर रविवार म्हणजे हक्काचा लोळत घालवण्याचा दिवस पण शिल्पशैलीचा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा पासून लोळायला जीवावरच येत आहे म्हणून ऐतिहासिक भटकंती करायला नेहमी सोबतीला असणारा मित्र ओंकारला सोबत घेतलं आणि सकाळीच लोकल पकडून अंबरनाथला उतरलो. पेटपूजा केली आणि थेट गाठले शिवमंदिर !

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिर हे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन शिल्प परंपरेचे आरंभस्थान मानण्यात येते. हे मंदिर शिलाहार राजघराण्याचा शासक चित्तराज याने बांधवयास घेतले आणि त्याचा मुलगा मामावाणीराज म्हणजेच मुम्मूणी याने इस १०६० ला पूर्ण केले कारण शिलालेखात शके ९८२ असा उल्लेख आहे, या मंदिर शैलीला “भूमीज शैली” असे म्हणतात व ह्या शैलीचे तसेच व्यक्तिगत उल्लेख असलेले हे पहिलं मंदिर आहे. अंबरनाथचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. ह्या मंदिराला सभामंडप, अंतराळ व नंतर गर्भगृह आहे. प्रत्येक मंडपाचा कोन एकमेकांना जोडून त्यांची मांडणी केलेली आहे. शिवाय भिंतींची मांडणी अशी आहे कि, बाहेरून हे दोन्ही नक्षत्राकृती भासतात. या मंदिराच्या पृष्ठभागावर देवदेवता, अप्सरा, यक्ष, व्याल, गजथर, किर्तीमुख असे शिल्प कोरलेले आहेत. अशाप्रकारे जोत्यावर एक एक स्तरावर नक्षीकाम केलेले आहे. खालील फोटोत पाहू शकता वाद्य वाजवण्यात तल्लीन झाले वादक आणि मध्यभागी नर्तकीने घेतलेला ठेका….
2017-10-09_11.47.15.jpg
वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर बांधलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे. कळस भग्न झालेला असून संपूर्णतः चहू बाजूंनी हे मंदिर शिल्पांनी नटलेले आहे. सुरसंदरी, विष्णू, शिव-पार्वतीचे विविध शिल्प, वराहशिल्प अशी बरीच शिल्प तिथे पहावयांस मिळतात. खुरशिला त्यावर चारही बाजूला असलेला गजथर, त्यावर स्तंभांची आधारशिळा व त्यावर मंडोवर असून पुढे कळस शिल्पकला सुरु होते. जागोजागी फिरवलेली वेलबुट्टीचे नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. या मंदिरावर शिवाचे भक्त शृंगी-भृंगीसुद्धा पहावयांस मिळतात. पत्रलेखिका, दर्पणसुंदरी, बुटकीसखी, नर्तकी, वादक, स्त्री वादक, सुरसुंदरी, योगी, मर्कटछळ, अशी विविध शिल्प कोनाकोनांत लपलेली आढळतात. मंदिराच्या चहू बाजूंना देवकोष्टी आहेत व त्यात विविध देव विराजमान आहेत. मंदिरात जाण्यासाठी तीन दरवाजे असून त्याच्या सर्व बाहेरील बाजूच्या द्वारललाटबिंबावर गजानन कोरलेले आहेत तसेच प्रत्येक खांबावर भारवाहक यक्ष कोरलेले दिसून येतात. द्वारललाटबिंबाच्यावर उत्तररांग व उंबरठ्यावर किर्तीमुख कोरलेले आहेत. मंदिरात प्रवेश करताना थोडंस आश्चर्यचकित व्हायला होतं कारण इथे दोन नंदी आहेत कारण गर्भगृहात दोन लिंग आहेत, असे स्थानिक सांगतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एक लिंग स्वयंभू आहे. द्वाराजवळ असलेला हा नंदी शिल्पकलेच्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो. सभामंडपात आतमध्ये प्रवेश केल्यावर चार भल्या मोठ्या स्तंभांवर पहिला मंडप तोललेला असून खाली एक बऱ्यापैकी मोठा चौथरा आहे ज्यावर एकेकाळी नंदी असू शकतो, असे वाटते. इथूनच वरती पाहिल्यास मधल्या गोलाकार छताची रचना एककेंद्री वर्तुळाची मालिका असल्याप्रमाणे आहे. एका बिंदूभोवती मोठी होत जाणारी वर्तुळ काढली तर नेमके असेच दिसले हे प्रत्यक्षात पाहिल्यावर जाणवते. ह्या प्रकाराला सभापद्म प्रकारचे छत म्हणतात. बाजूला सभामंडपाचे चार-चार खांबांच्या रांगा दोन बाजूला असून संपूर्ण सभामंडप त्यावर तोललेला आहे. ह्या मंडपाचे छत समतलवितान आहे म्हणजेच सपाट आहेत. भारवाहक यक्ष इथे मात्र लक्ष वेधून घेतात. संपूर्ण स्तंभ चहू बाजूंनी शिल्पांनी सजलेले आहेत. त्यावर काही ठिकाणी मैथुनशिल्पसुद्धा आढळतात. स्तंभावर विष्णू, शिव व पार्वती, गणराय तर काही ठिकाणी योगी कोरलेले दिसून येतात. सभामंडपात असलेला परंतु तिथे नंदी नसलेला हा मंडप अंतराळाला चिकटून उभा आहे. हा संपूर्ण मंडप बंदिस्त असल्यामुळे ह्याला गुढमंडपसुद्धा म्हणतात.
गुढमंडपातून पुढे अंतराळ आहे. दोन्ही बाजूला भिंतीत देवळ्या असून त्याला खांब व कमान आहेत. ह्यालाच “देवकोष्ठ” म्हणतात ज्या मध्ये मूर्ती नाही. अंतराळाचे छत सपाट आहे. संपूर्ण एक शिळा तिथे वापरलेली आहे व त्यावरसुद्धा नक्षीकाम आहे. द्वारललाटबिंबावर गणराय असून वरती उत्तररांग आहे. ह्या उत्तररांगात शिव व इतर देवता कोरलेल्या आहेत. उंबरठ्याला मंडारक म्हणतात त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे व इथे अर्धचंद्राकृती पायरी असल्यामुळे त्याला “अर्धचंद्रशिला” असेही म्हणतात.
हे मंदिर पाहताना किती योजनापूर्वक कोरलेले असेल, हे जाणवते. आज शिखर भग्नावस्थेत आहे परंतु पूर्वी ते किती उत्तुंग आणि नक्षीदार असेल ह्याची कल्पना आपल्याला येते. मंडपाच्या शिखराचा आकार पिरॅमिडप्रमाणे कोनासारखा आहे, याला “संवरण” म्हणतात. शिखरांच्या चार कोनांकडे पाहिल्यास खांबाप्रमाणे कोरीवकाम त्याचे केलेले आहे. दुरून पाहिल्यास ते खांबच वाटतात. मंडोवरावर महाकाली, अक्राळविक्राळ अन् भितीदायक कोरलेली आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे चार मुखांचा ब्रम्हदेव इथे दिसतो. ब्रम्हदेवाचे चौथे मुख मागे असून पुढून फक्त तीनच मुख दिसतात. काही ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म हातात घेतलेला उंच मुकुट परिधान केलेला विष्णू दिसून येतो. उग्र स्वरूपाची शस्त्रधारी दुर्गा म्हणजे आदिमायेचे संहारक रूपाचे शिल्प इथे पाहता येते. गजासुराचा वध सुद्धा इथे शिल्पात कोरलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने मूर्ती कोरुन कलाकार कलेच्या माध्यमातून देवाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर बिंबवत असतो. गाभाऱ्यात जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून जावे लागते. गाभारा अगदी साधा आहे. कोणतेही नक्षीकाम गाभाऱ्यात दिसत नाही. जमिनीतून वर शिवलिंग आल्यामुळे ते स्वयंभू मानले जाते. ह्या लिंगाला मुखलिंग म्हणतात कारण ह्यावर चेहरे कोरलेले आहेत.

मंदिराच्या बाजूला पुष्करणी असून त्याच्या चारही कोपऱ्यांवर शिल्प कोरलेली आहेत. एकेकाळी अंबरनाथ गावाच्या बाहेर असलेले हे मंदिर आज मध्यवर्ती ठिकाणी आल्यासारखे वाटते. मंदिराच्या आजूबाजूला बागबगीचा केलेला आहे. तर असे हे मंदिर सेंट्रल रेल्वेचे स्थानक अंबरनाथ इथून चालत अवघे १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
या मंदिराचे काही फोटो खास तुमच्यासाठी….
यवनी आक्रमणात कळस तोडला गेला पण आज जे काही शिल्लक आहे ते पाहू शकता….
2017-10-09_11.42.39.jpg
शिलाहारांचे अप्रतिम स्थापत्यकला एकावरएक दगड रचण्यासाठी बाजूला असलेले हॅन्डल….
2017-10-09_11.41.32.jpg
मदमस्त हत्तीला अंकुशाने अंकित करण्याच्या प्रयत्नात असलेला माहूत….
2017-10-09_11.48.19.jpg
तांडव नृत्य
2017-10-09_07.28.27.jpg
वराहवतार
2017-10-09_07.35.52.jpg
दर्पणसुंदरा
2017-10-09_11.40.14.jpg
भारवाहक यक्ष
2017-10-09_09.06.03.jpg
विष्णूवे नमो:
2017-10-09_07.33.56.jpg
अक्राळ विक्राळ महाकाली
2017-10-09_09.04.46.jpg
नरसिंह….
2017-10-09_11.50.26.jpg
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी…. (बुटकी सखी पायात गेलेला काटा काढताना….)
2017-10-09_07.30.44.jpg
एकेकाळी बलाढय रूप धारण करणारी वालधुनी आता ओढ्यासारखी दिसते, खालील फोटोत पाहू शकता किनाऱ्यावर असलेले शिवमंदिर !

ह्या मंदिराला नक्की भेट द्या कारण इतके सुंदर मंदिर पाहण्यासाठी जास्त चालावेही लागत नाही आणि लोकलच्या प्रवासामुळे झटकन पोहचता येते.

बर्‍याचदा वीकांताचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्‍याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच विसरलेलं नाही म्हणणार पण लक्षात असूनही जाणं न झालेलं ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर.
इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्‍याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.

खालच्या फोटोत दोन्ही नंदी.

हा देवळाचा गाभारा. गाभार्‍यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्‍यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्‍यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.

नंदी परत एकदा
 
खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्‍याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.

हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्‍यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.


अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर,
भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)

http://sagarshivade07.blogspot.com/2014/03/blog-post.html
शिवमंदिर - अंबरनाथ 

मागील महिन्यात झालेल्या जुन्नर मधील मोठ्या ट्रेक मध्ये, चावंड किल्ल्या जवळ असलेल्या पांडवकालीन कुकडेश्वर मंदिराला जाण्याचा योग आला होता. त्या मंदिराचा इतिहास आणि अखंड अश्या शिळेवर केलेले अतुल्य कोरीवकाम बघून मन थक्क होऊन गेले. त्याचा मिळाला तेवढा इतिहास मी त्या धाग्यात लिहिलेलाच आहे पण ते मंदिर बघून पुणे-मुंबई जवळची इतरही अनेक पुरातन मंदिरांचा शोध सुरु झाला. 
पुण्याजवळच अशी ५-६ पुरातन मंदिरे आहेत हे आजपर्यंत माहित नव्हते. त्यामुळे आता किल्ल्यावरून आमचा मोर्चा मंदिरांकडे वळवला. 

पुणे -मुंबई प्रवासा दरम्यान असलेले अंबरनाथ येथेही असेच पुरातन मंदिर आहे हे कळल्यावर मग तिकडे जायचा बेत केला. अंबरनाथ स्टेशन पासून चालत २०-२५ मिनिटावर हे मंदिर असून सध्या फारच वाईट दिवस भोगत आहे. एवढ्या मध्यवस्तीत असूनही ते अजून तग धरून आहे हेच विशेष. 

मंदिराच्या बाहेरून बघताच हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम उदाहरण आहे हे आपल्या लक्षात येतेच. त्यावर कोरलेली बरीचशी शिल्पे हे ओळखता येत नाहीत. प्रवेशद्वारात असलेली काही शिल्पे ओळखता आली पण १-२ शिल्पे ओळखून मंदिर पाहिले असे म्हणणे साप चावून न घेताच तो विषारी आहे म्हणण्या सारखे आहे. :) 

मंदिराला अंदाजे सहा बाजू आहेत. प्रत्येक बाजूवर वेगवेगळ्या प्रसंग वा संदेश देणारी शिल्पे आहेत. पायथ्यापासून शिल्पांचे नक्षीकाम सर्व बाजूने एकसारखे आहे. गुडघाभर उंचीवर सर्व बाजूने हत्तींच्या आणि माहुतांच्या  प्रतिमा कोरलेल्या आहेत. 

बाकी बरेच काही आहे अजून लिहिण्यासारखे. प्रत्येक शिल्पाचा अर्थ लावून त्यावर लिहायला अभ्यासाची गरज आहे. तरच त्या हजारो वर्षापूर्वीच्या शिल्पांना न्याय दिल्यासारखे होईल. ( आता मी या स्थापत्य कलेच्या अत्तुच्य कलेला न्याय देणे म्हणजे गाढवाने स्वतच्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यासारखे आहे हा भाग निराळा, पण असो. ) 

तूर्तास, काही फोटो येथे डकवत आहे. जसा जसा शिल्पांचा अर्थ लागतो तसा डिटेलवार त्यावर लेख लिहीनच. 

मंदिराला ४ प्रवेशद्वारे आहेत. प्रत्येकाची दिशा फारच परफेक्ट आहे. मंदिराबाहेरून फोटो काढता येतात. आत फोटो काढण्यास मनाई आहे. 



आम्ही त्या मंदिरावर काहीतरी बघून ते ओळखतो आहोत आणि फोटो काढत आहोत हे पाहून बरीच मंडळी आमच्या बरोबर जमली होती. रोज मंदिरात येणाऱ्या पण शिल्पांकडे ढुंकूनही न बघणारी मंडळीही आज उत्साहाने मंदिर बघत होती. प्लस आमच्या हातातील कॅमरे बघून काही लोकांना आपण पण टीव्ही मध्ये दिसू असे वाटले होते जणू, ते प्रत्येक फोटोत लुडबुड करत होती. 

असो, पण आमच्या निमित्ताने का होईना अजून चार लोकांनी ते मंदिर डोळे उघडून ( व फाडून) पाहिले याबद्दल शंकराने पुण्ण्याचा एक पोईंट माझ्या अकौंट वर जमा केला असेल एवढे नक्की. :) 


सागर  
 
 
अंबरनाथचे शिवमंदिर : अंबरनाथ येथील शिवमंदिर हे महाराष्ट्रातील शिल्पकलेचा जणू खजिनाच आहे. अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश ‘युनेस्को’ने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूंमध्ये होतो. 

अंबरनाथचे शिवमंदिरअंबरनाथचे शिवमंदिर


वालधुनी नदीच्या काठावरील, हेमाडपंती शैलीतील हे मंदिर सन १०२२ ते १०६० या कालावधीमध्ये बांधून पूर्ण झाले. शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्याचा धाकटा भाऊ माम्वाणी राजाच्या काळात सन १०६०मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना समजले जाते.
अंबरनाथचे शिवमंदिर हे संपूर्ण भारतवर्षातील पहिले भूमिज मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर  शिल्पशास्त्राप्रमाणे सप्तांग भूमिज पद्धतीत मोडते. भूमिजशैली ही नागरशैलीची उपशैली समजली जाते. या मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. एकावर एक असे सात भूमी (म्हणजे शिल्प रांगा) रचण्यात आले होते; मात्र कालांतराने गाभाऱ्यावरील शिखर नष्ट झाल्यामुळे तीनच भूमी (शिल्प रांगा) शिल्लक आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची रचना या मंदिराचा अभ्यास करून करण्यात आली आहे असे म्हणतात. 

अंबरनाथचे शिवमंदिर


मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून त्याशिवाय आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या प्रवेशदाराजवळ एक शिलालेख आहे. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एका खंडात इ. स. १०६०च्या शिलालेखाचा उल्लेख आहे. मंदिराचे गर्भागृह हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. छत व कळस यामध्ये पोकळी ठेवलेली आहे. कोनात जोडलेल्या गाभाऱ्यामुळे ऊन-सावल्यांचे वेधक दृश्य पाहायला मिळते. मंदिरासमोरील नंदीमंडप व संरक्षक भिंत अस्तित्वात नाही. 

या मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी असते. गाभाऱ्याच्या दरवाज्यावरील गणेशपट्टावरच्या भागात शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत असून त्याच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाच्या आतील भागावर एकाखाली एक वर्तुळे कोरलेली आहेत. पाण्यावर टाकलेल्या दगडामुळे जशा लहरी उमटतात तशी ती दिसतात. मंडपातील खांबांवर अनेक शिल्पाकृती साकारल्या आहेत. त्यांची संख्या ७०च्या आसपास आहे. विविध मुद्रांमधील शंकर-पार्वतीच्या मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. 

मंदिराच्या बाहेरील बाजूसही भिंतीवर असंख्य शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात. या मंदिरातील शिल्पामध्ये आठ हात असलेली एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ती अत्यंत सुबकपणे कोरलेली असून, कामदेवाचे शरीरसौष्ठव, अलंकार सुस्पष्टपणे आणि नाजूकपणे कोरलेले आहेत. या मंदिरातील एका मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. तिला तीन तोंडे असल्यामुळे तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू असून, शिवलिंगाऐवजी फक्त एक उंचवटा आहे. या शिवलिंगाला ‘अंबरेश्वर’ म्हणूनही ओळखले जात़े. याच मंदिराच्या नावावरून शहराला अंबरनाथ हे नाव पडले आह़े. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या प्राचीन शिवमंदिरात महादेवाच्या स्वयंभू पिंडीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिकांसह लांबून आलेल्या भाविकांच्या मंदिर परिसरात रांगा लागलेल्या दिसतात. वर्षभरातील इतर सोमवारच्या तुलनेत श्रावणातील सोमवारी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. 
 

अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)





मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.

मंदिराचे बांधकाम साधारण शके ९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली आहे. 

काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्तीशिवलिंगशंकराची मूर्ती ,पार्वतीनरमुंडधारी महाकालीशंकर पार्वती विवाहहंसा वर आरूढ ब्रम्हदेववराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपतीत्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही  शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे. 



मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.


मंदिराचे कोरीव काम हे खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे.  हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता येते.  दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात . 

मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.

मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो.  अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.

इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते
 
 
 
2017-10-09_07.26.51.jpg
उध्वस्त कळसात मुकं शिल्प बोलकी करण्याचा प्रयत्न करत आहे….
          मंदिर शैलीचा आणि विविध शिल्पांचा अभ्यास करताना जुन्या मंदिरांचे माझ्या मनात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. देव देवळात तर आहेच पण बारकाईने आणि अभ्यासू दृष्टिकोनातून पाहिल्यास देव शिल्पांमध्ये व ते कोरणाऱ्याच्या हातांमध्ये दिसून येतो. असेच एक उध्वस्त कळसाचे मंदिर मध्य रेल्वेचे स्थानक अंबरनाथ जवळ आहे. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून त्याचाकडे पाहता येते. ऑफिसला जाताना मला रोज ह्याच स्थानकाला पार करून जावे लागते पण तिथे कधी जाण्याचा योग आला नव्हता तो काल आला. तसं पाहिलं तर रविवार म्हणजे हक्काचा लोळत घालवण्याचा दिवस पण शिल्पशैलीचा जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा पासून लोळायला जीवावरच येत आहे म्हणून ऐतिहासिक भटकंती करायला नेहमी सोबतीला असणारा मित्र ओंकारला सोबत घेतलं आणि सकाळीच लोकल पकडून अंबरनाथला उतरलो. पेटपूजा केली आणि थेट गाठले शिवमंदिर !
2017-10-09_11.44.55.jpg
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिवमंदिर हे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन शिल्प परंपरेचे आरंभस्थान मानण्यात येते. हे मंदिर शिलाहार राजघराण्याचा शासक चित्तराज याने बांधवयास घेतले आणि त्याचा मुलगा मामावाणीराज म्हणजेच मुम्मूणी याने इस १०६० ला पूर्ण केले कारण शिलालेखात शके ९८२ असा उल्लेख आहे, या मंदिर शैलीला “भूमीज शैली” असे म्हणतात व ह्या शैलीचे तसेच व्यक्तिगत उल्लेख असलेले हे पहिलं मंदिर आहे. अंबरनाथचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. ह्या मंदिराला सभामंडप, अंतराळ व नंतर गर्भगृह आहे. प्रत्येक मंडपाचा कोन एकमेकांना जोडून त्यांची मांडणी केलेली आहे. शिवाय भिंतींची मांडणी अशी आहे कि, बाहेरून हे दोन्ही नक्षत्राकृती भासतात. या मंदिराच्या पृष्ठभागावर देवदेवता, अप्सरा, यक्ष, व्याल, गजथर, किर्तीमुख असे शिल्प कोरलेले आहेत. अशाप्रकारे जोत्यावर एक एक स्तरावर नक्षीकाम केलेले आहे. खालील फोटोत पाहू शकता वाद्य वाजवण्यात तल्लीन झाले वादक आणि मध्यभागी नर्तकीने घेतलेला ठेका….
2017-10-09_11.47.15.jpg
वालधुनी नदीच्या किनाऱ्यावर बांधलेले हे मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे. कळस भग्न झालेला असून संपूर्णतः चहू बाजूंनी हे मंदिर शिल्पांनी नटलेले आहे. सुरसंदरी, विष्णू, शिव-पार्वतीचे विविध शिल्प, वराहशिल्प अशी बरीच शिल्प तिथे पहावयांस मिळतात. खुरशिला त्यावर चारही बाजूला असलेला गजथर, त्यावर स्तंभांची आधारशिळा व त्यावर मंडोवर असून पुढे कळस शिल्पकला सुरु होते. जागोजागी फिरवलेली वेलबुट्टीचे नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. या मंदिरावर शिवाचे भक्त शृंगी-भृंगीसुद्धा पहावयांस मिळतात. पत्रलेखिका, दर्पणसुंदरी, बुटकीसखी, नर्तकी, वादक, स्त्री वादक, सुरसुंदरी, योगी, मर्कटछळ, अशी विविध शिल्प कोनाकोनांत लपलेली आढळतात. मंदिराच्या चहू बाजूंना देवकोष्टी आहेत व त्यात विविध देव विराजमान आहेत. मंदिरात जाण्यासाठी तीन दरवाजे असून त्याच्या सर्व बाहेरील बाजूच्या द्वारललाटबिंबावर गजानन कोरलेले आहेत तसेच प्रत्येक खांबावर भारवाहक यक्ष कोरलेले दिसून येतात. द्वारललाटबिंबाच्यावर उत्तररांग व उंबरठ्यावर किर्तीमुख कोरलेले आहेत. मंदिरात प्रवेश करताना थोडंस आश्चर्यचकित व्हायला होतं कारण इथे दोन नंदी आहेत कारण गर्भगृहात दोन लिंग आहेत, असे स्थानिक सांगतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एक लिंग स्वयंभू आहे. द्वाराजवळ असलेला हा नंदी शिल्पकलेच्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो. सभामंडपात आतमध्ये प्रवेश केल्यावर चार भल्या मोठ्या स्तंभांवर पहिला मंडप तोललेला असून खाली एक बऱ्यापैकी मोठा चौथरा आहे ज्यावर एकेकाळी नंदी असू शकतो, असे वाटते. इथूनच वरती पाहिल्यास मधल्या गोलाकार छताची रचना एककेंद्री वर्तुळाची मालिका असल्याप्रमाणे आहे. एका बिंदूभोवती मोठी होत जाणारी वर्तुळ काढली तर नेमके असेच दिसले हे प्रत्यक्षात पाहिल्यावर जाणवते. ह्या प्रकाराला सभापद्म प्रकारचे छत म्हणतात. बाजूला सभामंडपाचे चार-चार खांबांच्या रांगा दोन बाजूला असून संपूर्ण सभामंडप त्यावर तोललेला आहे. ह्या मंडपाचे छत समतलवितान आहे म्हणजेच सपाट आहेत. भारवाहक यक्ष इथे मात्र लक्ष वेधून घेतात. संपूर्ण स्तंभ चहू बाजूंनी शिल्पांनी सजलेले आहेत. त्यावर काही ठिकाणी मैथुनशिल्पसुद्धा आढळतात. स्तंभावर विष्णू, शिव व पार्वती, गणराय तर काही ठिकाणी योगी कोरलेले दिसून येतात. सभामंडपात असलेला परंतु तिथे नंदी नसलेला हा मंडप अंतराळाला चिकटून उभा आहे. हा संपूर्ण मंडप बंदिस्त असल्यामुळे ह्याला गुढमंडपसुद्धा म्हणतात.
गुढमंडपातून पुढे अंतराळ आहे. दोन्ही बाजूला भिंतीत देवळ्या असून त्याला खांब व कमान आहेत. ह्यालाच “देवकोष्ठ” म्हणतात ज्या मध्ये मूर्ती नाही. अंतराळाचे छत सपाट आहे. संपूर्ण एक शिळा तिथे वापरलेली आहे व त्यावरसुद्धा नक्षीकाम आहे. द्वारललाटबिंबावर गणराय असून वरती उत्तररांग आहे. ह्या उत्तररांगात शिव व इतर देवता कोरलेल्या आहेत. उंबरठ्याला मंडारक म्हणतात त्यावर किर्तीमुख कोरलेले आहे व इथे अर्धचंद्राकृती पायरी असल्यामुळे त्याला “अर्धचंद्रशिला” असेही म्हणतात.
हे मंदिर पाहताना किती योजनापूर्वक कोरलेले असेल, हे जाणवते. आज शिखर भग्नावस्थेत आहे परंतु पूर्वी ते किती उत्तुंग आणि नक्षीदार असेल ह्याची कल्पना आपल्याला येते. मंडपाच्या शिखराचा आकार पिरॅमिडप्रमाणे कोनासारखा आहे, याला “संवरण” म्हणतात. शिखरांच्या चार कोनांकडे पाहिल्यास खांबाप्रमाणे कोरीवकाम त्याचे केलेले आहे. दुरून पाहिल्यास ते खांबच वाटतात. मंडोवरावर महाकाली, अक्राळविक्राळ अन् भितीदायक कोरलेली आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे चार मुखांचा ब्रम्हदेव इथे दिसतो. ब्रम्हदेवाचे चौथे मुख मागे असून पुढून फक्त तीनच मुख दिसतात. काही ठिकाणी शंख, चक्र, गदा, पद्म हातात घेतलेला उंच मुकुट परिधान केलेला विष्णू दिसून येतो. उग्र स्वरूपाची शस्त्रधारी दुर्गा म्हणजे आदिमायेचे संहारक रूपाचे शिल्प इथे पाहता येते. गजासुराचा वध सुद्धा इथे शिल्पात कोरलेला आहे. गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूने मूर्ती कोरुन कलाकार कलेच्या माध्यमातून देवाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर बिंबवत असतो. गाभाऱ्यात जाण्यासाठी आपल्याला काही पायऱ्या उतरून जावे लागते. गाभारा अगदी साधा आहे. कोणतेही नक्षीकाम गाभाऱ्यात दिसत नाही. जमिनीतून वर शिवलिंग आल्यामुळे ते स्वयंभू मानले जाते. ह्या लिंगाला मुखलिंग म्हणतात कारण ह्यावर चेहरे कोरलेले आहेत.
2017-10-09_11.43.47.jpg
मंदिराच्या बाजूला पुष्करणी असून त्याच्या चारही कोपऱ्यांवर शिल्प कोरलेली आहेत. एकेकाळी अंबरनाथ गावाच्या बाहेर असलेले हे मंदिर आज मध्यवर्ती ठिकाणी आल्यासारखे वाटते. मंदिराच्या आजूबाजूला बागबगीचा केलेला आहे. तर असे हे मंदिर सेंट्रल रेल्वेचे स्थानक अंबरनाथ इथून चालत अवघे १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
या मंदिराचे काही फोटो खास तुमच्यासाठी….
यवनी आक्रमणात कळस तोडला गेला पण आज जे काही शिल्लक आहे ते पाहू शकता….
2017-10-09_11.42.39.jpg
शिलाहारांचे अप्रतिम स्थापत्यकला एकावरएक दगड रचण्यासाठी बाजूला असलेले हॅन्डल….
2017-10-09_11.41.32.jpg
मदमस्त हत्तीला अंकुशाने अंकित करण्याच्या प्रयत्नात असलेला माहूत….
2017-10-09_11.48.19.jpg
तांडव नृत्य
2017-10-09_07.28.27.jpg
वराहवतार
2017-10-09_07.35.52.jpg
दर्पणसुंदरा
2017-10-09_11.40.14.jpg
भारवाहक यक्ष
2017-10-09_09.06.03.jpg
विष्णूवे नमो:
2017-10-09_07.33.56.jpg
अक्राळ विक्राळ महाकाली
2017-10-09_09.04.46.jpg
नरसिंह….
2017-10-09_11.50.26.jpg
काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी…. (बुटकी सखी पायात गेलेला काटा काढताना….)
2017-10-09_07.30.44.jpg
एकेकाळी बलाढय रूप धारण करणारी वालधुनी आता ओढ्यासारखी दिसते, खालील फोटोत पाहू शकता किनाऱ्यावर असलेले शिवमंदिर !
IMG_20171008_105828.jpg
ह्या मंदिराला नक्की भेट द्या कारण इतके सुंदर मंदिर पाहण्यासाठी जास्त चालावेही लागत नाही आणि लोकलच्या प्रवासामुळे झटकन पोहचता येते.

बर्‍याचदा वीकांताचे प्लान शहराबाहेर भटकण्याचे होतात. आपण राहतो तिथे आसपास बर्‍याचदा प्रेक्षणीय स्थळं असतात, पण अशी ठिकाणं भटकंतीचे प्लान करताना आपण विसरुन जातो किंवा तिथे काय कधीही जाता येईल म्हणून ते रद्द करतो. असंच विसरलेलं नाही म्हणणार पण लक्षात असूनही जाणं न झालेलं ठिकाण म्हणजे अंबरनाथचं शिवमंदिर.
इथे येण्यासाठी मध्य रेल्वेच्या अंबरनाथ, बदलापूर, कर्जत किंवा खोपोली यापैकी लोकलचा पर्याय आहे. अंबरनाथ पूर्वेला उतरुन रिक्षाने देवळापर्यंत जाता येईल.
आम्ही गेलो ती वेळ नेमकी दुपारची तीन साडेतीनची होती. देवानेही वामकुक्षी घेतली असा कदाचित भक्तजनांचा समज झाला असल्याने तिथली दोन चार टाळकी आणि सुरक्षारक्षक वगळता शुकशुकाट होता. ;)
मंदिराची बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. बर्‍याचदा याचा उल्लेख 'हेमाडपंथी' होतो, ते हेमाडपंती असं असायला हवं. हेमाद्री पंडित अथवा हेमाडपंत जे देवगिरीच्या यादवांच्या काळात वास्तुविशारद होते, त्यांनी शोध लावलेली शैली म्हणजे हेमाडपंती शैली. ज्यात मुख्यत्त्वेकरुन दगड, व चुना यांचा बांधकामात वापर होत असे.
अशी माहिती मिळते की हे मंदिर शके ९८२ किंवा इ.स. १०६० मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममवाणी राजदेव यांनी बांधलं आणि मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपूर्वीचा आहे. पुरातत्त्व विभाग व केंद्र सरकारने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.
हा देवळाबाहेरचा नंदी, खरंतर दोन नंदी आहेत पण एकाचाच जवळून फोटो घेता आला.

खालच्या फोटोत दोन्ही नंदी.

हा देवळाचा गाभारा. गाभार्‍यातल्या दोन तीन फोटोंपैकी हाच एक शिल्लक राह्यला. कारण गाभार्‍यात फोटो काढतोय म्हणताना रखवालदार मागोमाग आला. आम्ही गाभार्‍यातले एकदोन फोटो त्याच्यादेखत डिलीट केले तेव्हा त्याच्या मनाची शांती झाली. असो.

नंदी परत एकदा

आता पुढचे काही फोटु हे देवळाबाहेरचं नक्षीकाम दाखवतात.



देवळाच्या मागील भाग


ही गणेशमूर्ती....


हा बहुधा नृत्य गणेश असावा.

त्यात शिवपार्वती विवाहाची पण काही दृश्य आहेत..हे बहुतेक त्या विवाहातल्या आमंत्रितांपैकी कोणीतरी...

या नर्तकी...अप्सरा..यांचे अलंकार, केशभूषा ज्या बारकाईने कोरलेत त्याचं कौतुक करावं तितकं कमी.


हे कोरीव खांब ..

आदिमायेचं रौद्ररुप !!

ही मूर्ती कसली असावी याचा अंदाज बांधणं कठीण होत होतं, शिवपार्वती म्हणावं तर आणखी दोन मुखं कोरलेली दिसत होती. कदाचित ब्रम्हदेवाची असावी. पण अशी सपत्नीक मूर्ती कधी पाह्यली नाही म्हणून कळत नाहीये काय ते.

आणखी एक अप्सरा....भग्नावस्थेत असली तरी भुरळ पाडेल अशी.

आणखी एक उत्तम कलाकुसर असलेलं शिल्प

संपूर्ण देऊळ..


खिद्रापूरच्या कोपेश्वराच्या मंदिराशी ह्या मंदिराचे बरेचसे साम्य दिसत आहे. अतिशय अप्रतिम शिल्पकला.
शिलाहार भोज राजांनी महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक शिवमंदिरे बांधली. हेमाद्रीपंडित जरी यादवकालातअसला तरी मंदिरनिर्माणाची ही शैली बर्‍याच आधीपासून प्रचलित होती. चुन्याचा वापर बहुधा होत नसे. खाचा असलेले दगड आणि त्यात अडकणारे उंचवटा असलेले दगड अशीच एकावर एक रचना होत असे.

हेमाडपंती म्हटली जाणारी कित्येक मंदिरं हजार वर्षाहून जुनी आहेत, म्हणजे हेमाडपंतांच्या दोन्-चारशे वर्षे आधीची.
अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर, त्यांची आठवण झाली; राजेंचा धागा होता १०० वर्षांचा त्रिकोण्-द्वारसमुद्र-होयसळ सत्तेबद्द्लचा, तिथलीही काही शिल्पे अशीच वाटली. उपक्रमावर ऐहोळे आणि बदामी ह्याविषयी चंद्रशेखर ह्यांचा धागा होता, चाल्लुक्यांनी केलेल्या वास्तुरचनांबद्द्ल तेही दूरून पाहून असेच वाटत होते. परवा महाबळेश्वरात एका कोअपर्‍यात ओस पडलेले कृष्णामाइचे मंदिर(पंचगंगा मंदिर नव्हे;ते वेगळे) होते, तेही बरेचसे असेच होते.


अवांतर १ :- शिलाहारांनी नुसती मंदिरे बांधली असे नाही तर पन्हाळगडा सारखा भव्य दिव्य किल्लाही बांधलाय.
शिलाहारांनी पन्हाळाच नव्हे तर चंदन-वंदन, वैराटगड, कमळगड, पांडवगड, केंजळगड, कल्याणगड असे किल्लेही बांधलेत.
अवांतर २ :- अंबरनाथचे पांडवकालीन शिल्प्/मंदिर वगैरे म्हणतात ते हेच का?
हेच ते. जे जे भव्य दिव्य ते पांडवांनीच बांधलेले आहे असे म्हणण्याची येथे प्रथाच पडली आहे.
अवांतर३ :- आपल्याकडे नक्की काय आणि किती पांडवकालिन आहे? परवा रायगडाला जाताना पाली ह्या ठिकाणीलेणी दिसली; तीही म्हणे पांडवकालीन आहेत.
प्रत्य़क्ष बघायला जाता पांडवकालीन काहीही नाही. महाराष्ट्रातील वास्तूंचा ज्ञात इतिहास सातवाहनांपासून सुरु होतो. म्हणजे साधारण २२०० वर्षांपासून. रायगडाजवळच्या गांधारपाल्याची लेणी बौद्ध लेणी आहेत. २००० वर्षे जुनी इतकी.
अवांतर४:- ह्या मंदिरावरून भुलेश्वर ची काही छायाचित्रे पाहिली होती मिपावरच ५०फक्त ह्यांच्या धाग्यावर,
भुलेश्वरची शिल्पकला साधारण अशीच आहे. एकूणात ह्या मंदिरांवर दाक्षिणात्य शैलीची छाप आहे. खुद्द जुने महाबळेश्वराच्या मंदिराजवळही थोडेसे आडबाजूला शिल्पकलेने समृद्द असलेले अजून एक शिवमंदिर आहे तेही शिलाहारांनीच बांधलेले आहे. अमृतेश्वर, नागेश्वर, कुकडेश्वर, हरिश्चंद्रेश्वर ही अजून काही शिलाहारकालीन मंदिरे (भोज राजा झंझ याच्या कारकिर्दीत बांधलेली.)
 
 

Ambernath Shiva Temple

1 Vote


Not very far from Mumbai there is a marvelous 11th century temple of Lord Shiva. Very few people know about it and navigating to this place without gps can be tricky. But the grand monument is mostly intact with its rock carved sculptures and structural grace .. therefore, a must visit for heritage enthusiasts. Another unconfirmed trivia about this temple is it was visited by the great Guru Nanak in 1415 CE.

 


This temple was built by Mahamandaleswara Chittaraj in the 11th century. He belonged to the Silahara dynasty … Chittaraj’s younger brother Mummuniraj completed the temple in 1060 CE. The origins of this temple can be traced due to a stone inscription inside.

श्री अंबरनाथ देवकुला समुद्धारित

It is said that there was a swayambhu Shiva-linga situated next to the river stream and the kings decided to build this black stone temple over it. Therefore to enter the garbha-gruha one has to climb down about 9 stairs and the temple is west facing in direction which is quite rare. This is a temple built in a Bhumija structure and since this temple goes a few years before the similar temple in Udaipur MP … it is important as the first documented example of a bhumija temple.

 

Garbhabruha and mandapa are like to stars coming together separated by free space known as antaral which is in pragriv form here. The wall has beautiful projections and recesses. There are about 73 sculputed statues on the walls with some special improvisations in gods and godesses which unfortunately did not notice thanks to my ignorance in iconography (this demands another visit) and Sur-sundari nymphs too. The vertical decorations on the shikhara are known as latas and this temple is built in the saptarath-saptabhum-bhumij-prasad structure. Since this is built by a king it could be categorized as Asiddhyatan temple. The element I would love to design for my house was figurines on the rectangular faces on the columns

The pillars are ornately carved and have some similarities with the pillars of the Modhera sun temple built by the Solanki kings … I am sharing a photo from my trip to Modhera in 2008 … but that full story in another blog post.
modhera pillars

Modhera Sun temple, Gujarat

 https://chinmaye.com/2017/06/13/ambernath-shiva-temple/

मुंबईजवळच्या अंबरनाथ मंदिराची गोष्ट जे हजार वर्षांपूर्वी आम्रनाथ होतं

मुंबईपासून अवघ्या 60 किमी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने जाणून घेऊया या प्राचीन मंदिराची कहाणी.
राजा शिलाहार मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात हे मंदिर बांधलं असल्याचा शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाला सापडला आहे. एवढं ऐतिहासिक महत्त्व असलेलं हे मंदिर अनेक वर्षं दुर्लक्षितच आहे.

अजूनही अनेक मुंबईकरांना तसंच इथे येणाऱ्या पर्यटकांना या मंदिराची पुसटशीही माहिती नाहीये, असं दिसून येतं.

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.

तिथून एक रिक्षा केली की सुमारे अडीच किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. आणि अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.
या मंदिराचं भारतीय इतिहासात किती महत्त्वाचं स्थान आहे, याची कल्पना आम्हाला मुंबईतील 'जय हिंद कॉलेज'च्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. कुमुद कानिटकर यांनी दिली. साधारण पंचाहत्तरीच्या डॉ. कानिटकर यांनी या मंदिरावर संशोधन करून 'अंबरनाथ शिवालय' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.

डॉ. कानिटकर यांना या मंदिरातील शिल्पांबाबत खडा न खडा माहिती आहे. या मंदिराचे विविध पैलू उलगडताना त्या सांगतात, "अंबरनाथशी माझी कुठेतरी नशिबाने गाठ पडली. ही साधारण 1995ची गोष्ट असेल. मी प्राध्यापिका होते. त्यावेळी कॉलेजला सुट्ट्या होत्या. पण माझ्या मुलीची B.A.ची परीक्षा जूनपर्यंत चालणार होती. त्यामुळे मला कुठेच जाता येत नव्हतं.

"त्यावेळी योगायोगाने रिझर्व्ह बँकेचं कॅलेंडर हे मंदिरांवर होतं आणि त्यामध्ये अंबरनाथचं मंदिरही होतं. मी ते पाहून लगेचच मुंबईतल्या Asiatic Societyमध्ये जाऊन त्याबद्दलची माहिती गोळा केली."

'अंबरनाथ शिवालय' पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे.

1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि 'Bombay branch of the Royal Asiatic Society'च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.


त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये "...हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले", असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव 'आम्रनाथ' असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.

डॉ. कानिटकर सांगतात, "अंबरनाथचे शिवमंदिर हे सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक दृष्ट्या, हे एका मध्य ठिकाणी आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, गुजरात आणि कर्नाटकच्या शैलींचा त्यावर प्रभाव पडला आहे. त्या सगळ्या राजांचा यावर प्रभाव पडला आहे."

त्या सांगतात की, धारच्या भोज राजाच्या काळातील 'समरांगणसूत्रोध्दार' या शिल्पशास्त्रावरील ग्रंथात भूमीज मंदिर प्रकाराचा उल्लेख आहे. "काही लोक या मंदिराला हेमाडपंथी म्हणतात. पण हे चुकीचं आहे. भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर दगड रचून तयार केलेली वास्तू. हे असं एकच भूमिज मंदिर, ज्याचं द्राविडीकरण केलं गेलेलं आहे."
पुरात्त्व विभागाची सुरुवात
भारतीय पुरात्त्व विभागाचा आणि अंबरनाथचा अगदी जवळचा संबंध आहे. कानिटकर आपल्या पुस्तकात याविषयी सांगतात -

ब्रिटिश अधिकारी सर कनिंगहम यांना इतिहासाची आवड होती. भारतभर फिरताना सर्वत्र विखुरलेल्या मोडकळीस आलेल्या वास्तूंचे अवशेष त्यांनी पाहिले होते. 1861मध्ये सर कनिंगहम यांनी त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांना लिहिलेलं पत्र महत्त्वाचं आहे.

"भारताच्या ब्रिटिश अमलाखाली असलेल्या प्रदेशातून, कोणत्याही प्रांतातून, हिंडताना प्राचीन वारशाबद्दलची उदासीनता जाणवते. अत्यंत रेखीव आणि कलात्मक असूनसुध्दा प्राचीन वास्तूंची, स्मारकांची हेळसांड खिन्न करणारी आहे. जागोजागी पुरातन भारतीय संस्कृतीचे सुंदर अवशेष अगदी दुर्लक्षित अवस्थेत पडलेले दिसतात.

"'दुर्लक्षित' हा शब्द दुरुस्ती, डागडुजी, ह्याला उद्देशून नाही, इतक्या अवशेषांना दुरुस्त करणे, ही खर्चाच्या आणि परिश्रमाच्या दृष्टीने कोणत्याही सरकारच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. पण त्यांची साधी नोंदसुध्दा नसावी, ही फार खेदाची बाब आहे.

"माझ्या मते सरकारकडून ह्या महत्त्वाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या कर्तव्याचं पालन अगदी कमी खर्चात करता येण्यासारखं आहे. सर्वत्र विखुरलेल्या या अवशेषांची पाहणी करून, शोध घेऊन, व्यवस्थित नोंद करून ठेवली तर भावी पिढ्यांना ती उद्बोधक ठरेल. एरवी पुढच्या पिढ्यांना स्वतःचा इतिहास समजणार कसा?"

जेम्स फर्ग्युसन आणि कर्नल मेडोज टेलर, यांच्याकडून पत्रांद्वारे अशाच प्रकारचे अभिप्राय मिळाल्यानंतर एका विचारमंथनाअंती आर्कियोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया किंवा पुरातत्त्व विभागाचं (ASI) बीज रोवलं गेलं.

पहिले नकाशे, फोटो आणि ठसे
1868 साली प्रथम भारताच्या चार दिशांकडील चार स्मारकं प्रायोगिक तत्त्वावर अभ्यासायचं ठरलं. या सर्व्हेअंतर्गत फोटो, ड्रॉईंग्ज, नकाशे, मॉडेल्स आणि ठसे कशा तऱ्हेने घ्यावेत, याच्या सूचना बारीक तपशिलासह नोंदवण्यात आल्या.

प्रतिमा मथळा
डॉ. कानिटकरांनी या मंदिरावर एक 'अंबरनाथ शिवालय' नावाचं एक पुस्तकही लिहिले आहे.
डॉ. कानिटकर त्यांच्या पुस्तकात याबद्दल सविस्तर सांगतात -

या चार स्मारकांपैकी पश्चिम भागातून निवडलं गेलं बॉम्बे प्रांतातलं अंबरनाथाचं मंदिर. सुदैवाने त्याच सुमारास म्हणजे 1853मध्ये मुंबई-कल्याण रेल्वे सुरू झाली आणि मुंबईतच 'स्कूल ऑफ आर्ट' होतं.

या कामासाठी सरकारकडून 13 हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं. आणि 18 नोव्हेंबर 1868 रोजी एक टीम अंबरनाथमध्ये दाखल झाली. यात स्कूल ऑफ आर्टचे तत्कालीन प्रभारी व्यवस्थापक G. W. टेरी, एक हेड मोल्डर, एक ड्राफ्टमन आणि आठ विद्यार्थ्यांच्या समावेश होता.

त्यावेळी अंबरनाथची लोकसंख्या 300च्या आसपास होती. तब्बल वर्षभर काम करून 10,714 रुपये 3 आणे आणि 1 पै खर्च करून 24 आराखडे, 35 फोटो आणि 76 साचे अंबरनाथ मंदिराचे तयार करण्यात आले.

Image copyrightAIIS AMERICAN INSTITUTE OF INDIAN STUDIES GURGAON
डॉ. कानिटकर म्हणतात, "आपल्याकडे एवढा अमूल्य ठेवा आहे मात्र तो आपण जपायला हवा. मंदिराच्या परिसरात काहीच करायला नको. आज अंबरनाथच्या शिवमंदिराच्या अगदी काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. तसंच येथील MIDCच्या प्रदूषणाचाही परिणाम या मंदिरातील दगडावर होतोय.

"हे मंदिर मोठं पर्यटनस्थळ व्हावं, असं आपण म्हणत जरी असलो, तरी तशा सोयीसुविधा आपण देत नाही आहोत. आजही मंदिराच्या आवारात तुम्हाला टॉयलेटची सोय नाहीये. तसंच मंदिराबद्दलची खूप चुकीची माहिती पसरवली जाते. माझी अशी अपेक्षा आहे की मंदिर आवारात याबद्दल एखादी माहिती पुस्तिका वितरीत केली जावी, जेणेकरून लोकांना या मंदिराच्या इतिहासाबद्दलची खरी माहिती कळेल."

या मंदिराच्या परिसरात पवन शुक्ल यांचं संपूर्ण बालपण गेलं. त्यांच्या वडिलांनी 40 वर्षं या मंदिरामध्ये पुजाऱ्याचं काम पाहिलं. आता ही जबाबदारी ते पार पाडतात. ते सांगतात, "या मंदिरात दर श्रावण महिन्यात मोठा उत्सव असतो. तसंच महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे जत्रासुध्दा भरते. महाशिवरात्रीला तर अंदाजे दोन-अडीच लाख लोक येतात."
"या वास्तूला आता हजार पूर्ण होत आहेत. तरीही या वास्तूला डागडुजीची गरज आहे, असं मला वाटत नाही. या हजार वर्षात या मंदिराने तिन्ही ऋतू कित्येकवेळा पाहिले असतील. तरीही हे मंदिर अजूनही जसंच्या तसं आहे. या मंदिरावरील कोरीवकाम अत्यंत सुरेख आहे."

शुक्ला यांना वाटतं की "जी वास्तू जूनी आहे तिला जुनीच राहू दिलं तर ती चांगली दिसते. मात्र जर जुन्या वास्तूचं नूतनीकरण केलं तर तिचं ऐतिहासिक महत्त्व कमी होतं. ज्या पूर्वीच्या कलाकृती असतात, त्या तशा राहात नाहीत."
मुंबईच्याजवळ असूनही दुर्लक्षित
मंदिर परिसराजवळच 35 वर्षांपासून राहणारे आनंद तुळसंगकर यांनी या मंदिर परिसरात होणारे बदल जवळून पाहिले आहेत. ते सांगतात, "पूर्वी पेक्षा आता मंदिरात खूप बदल झाले आहेत. पूर्वी मंदिराच्या समोरील बाजूस काहीच नव्हतं. पण आता तिथे सुंदर बाग करण्यात आली आहे. तसंच येणाऱ्या भाविकांना इथे महाप्रसादही दिला जातो. पण हे बदल फार पूर्वीच व्हायला हवे होते, असं ते सांगतात.

"देशातील 12 ज्योतिर्लिंगांइतकंच हे मंदिर जुनं आहे. मात्र या मंदिराकडे प्रशासनाकडून पाहिजे तसं लक्ष दिलं गेलं नाही. मुंबईच्या इतक्या जवळ असूनही हे मंदिर दुर्लक्षितच राहिलं. आता मागील 4-5 वर्षांपासून या मंदिराकडे लक्ष दिलं जात आहे. मात्र हे फार पूर्वीच व्हायला हवं होतं. जर हे स्थळ पूर्वीच पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलं असतं तर आजचं चित्र फार वेगळं असतं. आता रस्ते, मंदिरातील लाद्या ते बसवल्यामुळे भाविकांची सोय झाली आहे."

याच मंदिराच्या परिसरात आम्हाला KEM रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी अधिष्ठाता नीलिमा क्षीरसागर भेटल्या. त्या 1960पासून मुंबईत राहात असलेल्या नीलिमा सांगतात, "आम्ही दोन दिवसापूर्वीच स्थानिक वृत्तपत्रात या मंदिराबद्दलची जाहिरात वाचली आणि मग आम्ही इथे आलो. आम्ही केवळ या मंदिराबद्दल ऐकून होतो, मात्र ते एवढं जुने आणि एवढं सुंदर असेल, याची कल्पनासुध्दा नव्हती.

"या मंदिराला मुंबईतील इतर वास्तूंप्रमाणे प्रसिध्दी मिळाली पाहिजे. सध्याच्या सुविधाही चांगल्या आहेत. मात्र त्या अजून चांगल्या करू शकतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिक सुखसोयी उपलब्ध करून द्यायला हव्यात," असं त्यांना वाटतं.

मागील तीन वर्षांपासून एका स्थानिक पक्षातर्फे महाशिवरात्री दरम्यान इथे आर्ट फेस्टिव्हल भरवला जातो आणि त्याच्या बऱ्याच प्रमाणात जाहिरातीही केल्या जातात. त्यामुळे या मंदिराबद्दल थोडी जनजागृती होऊ लागली आहे. परंतु जशी केवळ महाशिवरात्रीसाठी इथे स्वच्छता केली जाते, तशीच स्वच्छता नेहमी राहावी, अशीही अपेक्षा इथे येणारे पर्यटक आणि स्थानिक व्यक्त करतात.
 
 




अंबरनाथ.... मध्य रेल्वेच्या मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील एक रेल्वे स्टेशन. या शहराला प्राचीन ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे ते येथील प्रख्यात अंबरनाथ शिवमंदिरामुळे. या व्यतिरिक्त लहान असताना शाळेत परीक्षेत येणार एक प्रश्न सर्वांनाच आठवत असेल तो म्हणजे ‘‘.......... येथे काडेपेट्यांचा कारखाना (होता, आता बंद झाला) आणि लष्करी दारूगोळा उत्पादन करण्याचा कारखाना आहे ??? ’’ 
साहजिक उत्तर असायचं ....अंबरनाथ :-) अंबरनाथ ची आणखी एक ओळख म्हणजे हे आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असलेले शहर. येथील आनंदनगर व पश्चिमेकडील केमिकल झोन या औद्योगिक वसाहतीत हजारो विविध प्रकारचे उत्पादन घेणाऱ्या कंपन्या आहेत ज्यात रोज लाखो कामगार काम करतात... तसेच अंबरनाथ येथे भारतीय नौसेनेचे NMRL (Naval Materials Research Laboratory) हे संशोधन केंद्र आहे. येथे घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे अंबरनाथ हे नेहमीच मुंबई-महाराष्ट्रात सतत चर्चिले जाणारे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु प्राचीन काळा पासून माझ्या अंबरनाथ ची खरी ओळख आहे ती येथील शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेल्या पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिरा मुळे. 

संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्कोने United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न असलेल्या वास्तूंपैकी अंबरनाथ चे हे एक प्राचीन मंदिर. १९९९ साली युनेस्कोने या मंदिराला दर्जा दिला आहे. हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार छित्तराज याने इ.स. १०२० मध्ये बांधण्यास प्रारंभ केला व त्यानंतर त्यांचा मुलगा मुण्मणिराजाच्या कारकीर्दीत १० जुलै १०६० रोजी बांधकाम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याची नोंद इतिहास दरबारी आढळते.  मंदिर बांधण्यासाठी ४० वर्षे लागली. काही पौराणिक कथांमध्ये हे मंदिर पांडवकालीन असून हे मंदिर ५ पांडवांनी बांधल्याचे बोलले जाते. शिलाहार राजे हे शिवभक्त होते. त्यांनी अनेक मंदिरे उभारली. काही काळाच्या पडद्याआड गेली तर काही मंदिरे आजही त्यांचं अस्थित्व टिकवून आहेत. अंबरनाथ चे मंदिर त्या पैकीच एक,  अंबरनाथचे हे भूमिज शैलीतील मंदिर सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या पर्यटकांसाठी पाहण्या सारखे आहे. तसेच देशभरातील लाखो शिवभक्तांसाठी हे श्रद्धेचे ठिकाण आहे, मंदिरातील शिवलिंगाला अंबरेश्वर असे म्हंटले जाते, याच नावावरून अंबरनाथ हे नाव शहराला पडल्याचे बोलले जाते. 

भूमिज पद्धतीचे बांधकाम :-
महाराष्ट्रात शंकराची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे गड किल्ल्यांवर उभारली गेली आहेत. तर काही जमिनीवरही बांधली गेली. औरंगाबादजवळील घृष्णेश्वर मंदिर, भीमाशंकर येथील मंदिर, पुण्याजवळील भुलेश्वर, नाशिक येथील त्रंबकेश्वर ही त्यापैकीच एक. अंबरनाथ मंदिराची निर्मिती ही एका विशिष्ट शैलीत केली गेली आहे. भूमिज पद्धतीत बांधलेले हे शिवमंदिर अतिशय प्राचीन जुने मंदिर आहे. शिल्पशास्त्राप्रमाणे हे शिवमंदिर सप्तांग भूमीज पद्धतीत तयार केले आहे. मंदिराच्या पायाच्या कोनांची संख्या सात आहे. पूर्वी एकावर एक असे सात भूमी (शिल्परांगा) रचण्यात आल्या होत्या. मात्र गाभाºयावरील कळस नष्ट झाल्याने तीनच भूमी (शिल्परांगा) शिल्लक आहेत. सध्या मंदिराचा कळस अस्तित्वात नाही.

मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असून त्याशिवाय उत्तर व दक्षिण बाजूस आणखीन दोन प्रवेशद्वारे मंदिराला आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये असे बांधकाम पाहण्यास मिळते. संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिराची आठवण या ठिकाणी नक्कीच येते. हे मंदिर उभारताना गणिताचा विशेषत: भूमितीचा वास्तुशास्त्रात विचार केला गेल्याचे सहज लक्षात येते. केवळ दर्शनासाठी न जाता येथील स्थापत्यशास्त्राचा थोडा अभ्यास केल्यास हे आपल्याला हे सहज लक्षात येते. 

देवदेवतांच्या शिल्पांचे मंदिर :-

मंदिराबाहेरील शिल्पे अनेक हिंदु देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे कोरीवकाम आहे. या शिल्पांमध्ये गरुडासन विष्णू, शिव, विवाहापूवीर्ची पार्वती, शिव-पार्वती विवाह सोहळा, त्रिपुरा वध मूर्ती, पार्वती चामुंडा, नृत्यांगना, द्वारपाल, विष्णू, नटराज, कालीमाता, गणेश नृत्यमूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती, महिषासुर र्मदिनी या मूर्ती अत्यंत कुशलतेने दगडातून साकारलेल्या आहे. विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे, आभूषणे आणि वेशभूषाही साकारलेल्या आहेत. या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. तिला त्रिमुखी मूर्ती म्हणतात. हे बहुधा शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. मंदिर प्रदक्षिणा करताना मंदिराच्या भव्यपण लक्षात येते. मंदिराच्या उत्तर दिशेला एक छोटे बांधकाम केलेले आहे. त्यात शिवलिंगासह पार्वतीची मूर्ती आहे. या मंदिरात ब्रह्मा, शिव, सूर्य, विष्णू या देवता एकाच मूर्तीत शिल्पकाराने साकारलेले आहेत. मंदिराच्या भिंतीवर शिल्पकारांनी साकारलेल्या अनेक भव्य मूर्ती पाहून क्षणभर त्या आपल्याकडे पाहत असल्याचा भासही होतो. गेली ९०० वर्षे या मूर्ती आपले मौन सांभाळून आहेत. पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पे असी शिल्पकृती येथे आपणास पहावयास मिळते. मंदिराच्या बाहेर व आतमध्ये देवतांच्या मूर्ती कोरण्यात आल्यामुळे मंदिर सुंदर वाटते. मंदिराचा कळस हा अर्धवट च आहे त्या मागे हि अनेक काल्पनिक कथा आहेत. काही म्हणतात परकीय आक्रमकानीं मंदिराचा कळस तोडला तर काही म्हणतात पांडवांनी सकाळ झाली म्हणून मंदिर बांधकाम अर्धवट सोडले. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमांडपंती शैलीची मंदिरे बघायला मिळतात. त्यालाच 'भूमीज' स्थापत्य शैली असेही म्हणतात. सर्वच पुरातन मंदिरांना 'हेमांडपंती' शैलीची मंदिरे म्हणण्याच्या सवयच लोकांना लागून राहिलेली आहे. जुने मंदिर दिसले की हेमांडपंती मंदिर असल्याचे छातीठोकपणे लोकं सांगतात. देवगिरीच्या यादवांच्या काळातील वास्तुविशारद हेमाद्री पंडित अथवा हेमांडपंत यांनी मंदिर बांधण्याची एक विशिष्ट पद्धत निर्माण केली होती. त्या पद्धतीला हेमांडपंती शैली म्हणतात. चुन्याचा दर्जा न भरता घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे वैशिष्ट्य मानले जाते. अंबरनाथचे हे मंदिर हेमांडपंती पद्धतीने बांधलेले असून कोकणात आढळणाऱ्या काळ्या दगडाला आकार देऊन ते कोरलेले आह़े. 

मंदिरात प्रवेश करताना समोर प्रवेशद्वारापाशी दोन नंदी आहेत. मंदिरातील सभामंडपात चार खांब दिसून येतात. (आता सुरक्षेच्या कारणास्तव लोखंडी खांब व बीम ने त्यांना support दिला आहे) सभामंडपातील खांब म्हणजे कोरीवकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. मध्यभागावरील दगडी झुंबर त्याच्या भोवतालची वतुर्ळे, घुमटाकृती नक्षीकाम फारच सुंदर आहे. सभामंडपापासून दहा बारा पायऱ्या खाली उतरल्यावर आपण गाभाऱ्यात येतो. याच गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आह़े ज्यास आंबरेश्वर शिवलिंग असेही म्हंटले जाते. गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा भासतो, गाभाऱ्यातून वर पाहिल्यास आकाश दर्शन होते. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आपल्याला गोड्या पाण्याचे २ कुंड पाहायला मिळतात. 

अंबरनाथ च्या या प्राचीन शिवमंदिर परिसरात महाशिवरात्री ला मोठीजत्रा भरते लाखो भाविक त्या दिवशी अंबरेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून येथे येत असतात, हि जत्रा संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा असल्याचे बोलले जाते. तसेच श्रावणात येथे अनेक भाविक दूरदूर हुन दर्शन साठी येत असतात. आम्ही पण काही लहान असताना श्रावण महिन्यात दार सोमवारी पहाटे २-३ वाजता दर्शन घ्या साठी जात असे आमच्या कानसई मधील वरच्या आळीचे सर्व मिळून आम्ही पहाटे शंकराचे गाणी/भजन बोलत पाऊसात भिजत जायचो तेव्हा शिवमंदिरात. बाल विकस मंदिर शाळेत १ ली २री ला असताना आमची वार्षिक सहल पण कानसई ते शिवमंदिर अशी असायची :D पण एकाच खंत वाटते कि एवढा मोठा जागतिक सांस्कृतिक वारसा माझ्या शहरात असून वर्षातून केवळ ४-५ वेळच जण व्हायचं मंदिरात...  

शिवमंदिर आमच्या घर पासून फार लांब नाही तरी ज्यास्त जाण होत नसायचं आणि गेलो तरी ज्यास्त जवळून दर्शन घ्यायला मिळत नसे पण २०११ साली माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसा निमित्त श्री. कुणाल सुभाष भोईर KB (तत्कालीन मनसे अंबरनाथ विधानसभा क्षेत्र अध्यक्ष) यांनी शिवमंदिरात राजसाहेबाना दीर्घायुष्य लाभण्यासाठी एक पूजेचे आयोजन केले होते, तेव्हा प्रत्येक्षात जवळून अंबरेश्वर महादेवाची पूजा करण्याची संधी मिळाली. धन्यवाद KB... 





मागील वर्षी (२०१५) आमच्या अंबरनाथ चे खासदार (कल्याण लोकसभा क्षेत्र) डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी "शिवमंदिर आर्ट फेस्टिवल" चे आयोजन करून अनेक जागतिक कलाकारांना एकाच मंचावर बोलावून एक सुंदर Event चे आयोजन केले होते, त्यात जगात विख्यात पंडित जसराज,  पद्मश्री हरिहरन, प्रसिद्ध ड्रम वादक शिवमणी, इत्यादी अनेक प्रसिद्ध कलाकार माननीय खासदारांनी "शिवमंदिर आर्ट फेस्टिवल" च्या निमित्ताने अंबरनाथ येथे बोलावून अंबरनाथकरांना एक आगळीवेगळी भेट दिली होती तसेच विविध चित्रांचे प्रदर्शन, पुरातन शस्त्र प्रदर्शन, पुरातन वस्तू, चित्रकला प्रदर्शन असे अनेक कार्यक्रम घेऊन, अंबरनाथकारांची माने जिंकली होती तसेच त्या निमित्ताने काहीसा दुर्लक्षित झालेला शिवमंदिर परिसर पुन्हा नव्याने उजळून निघाला होता. 

काळाच्या ओघात म्हणा किंवा परकीय आक्रमणांमुळे म्हणा मंदिराच्या अनेक मूर्ती आज भग्नावस्थेत आहेत. ऊन, वारा आणि पाऊसामुळे या मूर्ती झिजल्या आहेत. पण तरी सुद्धा ज्या मूर्ती वाचल्या आहेत त्या मूर्तीचं शिल्पकलेचे अद्भूत दृश्य पाहून मन सुखावते. या मंदिरावर कोरलेली अनेक शिल्पे आजही या मंदिराच्या वैभवाची साक्ष देत आहेत. मंदिरात श्रावणात मोठी गर्दी असते. राज्यातील विविध भागांतून दर्शन घेण्यासाठी भक्तांच्या रांगा येथे लागतात. आपणही एकदातरी या अश्या शिल्पकलेचा उत्कृष्ट उदाहरण असलेल्या मंदिरास नक्की अवश्य भेट द्या.. 

कसे पोहचाल :-
अंबरनाथ हे मुंबई ते कर्जत या उपनगरीय मार्गावरील एक रेल्वे स्टेशन आहे कल्याण सोडल्यावर कर्जत च्या दिशेने ३ रे स्थानक अंबरनाथ हे आहे. (मुंबई पासून ६० किमी) अंबरनाथ स्थानकात उतरून पूर्व दिशेला शिवाजी चौक परिसरात येऊन सरळ खेर विभागाच्या दिशेने चालत निघालातत कि रेल्वे स्टेशन पासून साधारण दोन किमी अंतरावर वालधुनी नदीच्या काठी, अंबरनाथ व उल्हासनगरच्या सीमेवर हे प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी रेल्वे स्टेशन पासून ऑटो रिक्षाही उपलब्ध आहेत. चालत गेल्यास २०-२५ मी लागतात व ऑटो रिक्षाने गेल्यास ५-१० मी मध्ये आपण मंदिर परिसरात पोहचतो. 

जय अंबरेश्वर, जय महाराष्ट्र , जय अंबरनाथ !

शेखर शिवदास ठाकरे 
Doha, State of Qatar (Gulf) 
tshekhars@gmail.com 
+ 974 - 555 765 11  


 




http://myblogtshekhars-shivmandirambernath.blogspot.com/2016/08/blog-post.html


AMBERNATH SHIV TEMPLE, INDIA - zerobeyond


Dancing Lord Shiva
Ancient Architecture at its Best

Ancient architecture in India is very rich in heritage. Structures as ancient as the 11th Century is truly unique! Ambernath Shiv Temple may have been a little dilapidated to withstand historical climatic onslaught in the last 10 Centuries, but the marvel still stands like a true testament of extraordinary architectural endeavour.

Lord Shiva Temple

The Ambernath Shiv Temple was built during the 1060 AD in classical style by Chittaraja, King of Shi’erahala. Later on, the work was completed his son Mumunni. The temple is truly an out-of-this-world marvel, because it was built by carving a single large boulder.

Hemadpanti Architecture Style

The architecture of this temple is Hemadpanti style. The carvings of the outer wall are using black rock and are very exquisite.

Single Rock Structure

As per UNESCO records, the first-ever photos of the temple was taken by a British named Henry Cousens. Around 1850, the then director of the ASI – Archaeological Survey of India had also taken photos of the temple. The dilapidated state was visible in these photographs. Needless to say, trees grew on the walls of the temple. The ASI carried out detailed documentation as one of its pilot projects. The temple was rediscovered by the people, having lost for nearly 800 years.


Each year, during Shivratri (Lord Shiva’s marriage to Goddess Parvati) devotees flock to Ambernath in millions. The small suburban town of Ambernath becomes the centre of attention of Indians as well as many foreigners.

Nandi, Lord Shiva’s Carrier

History speaks about King Shilahara as a vassal of Rashtrakutas in the Konkan region. Towards the south, the mighty Kingdom of Chalukya was renowned. The temple is only a few miles away from the ancient trade route. The route leads to the Deccan Plateau. The structure’s arrangement is in a cross shape indicating an interesting fusion of architectural styles. The influence and characteristics of the Chalukyan kingdom is very much evident.

Above ground, the temple structure is up to 21 meters high. Nandi, the guardian of the main entrance to every Shiv temple is omnipresent. Interestingly, there are the two Nandis from the west porch. The two other porticoes are on the north side and the east side.

The structure’s outer wall is carved with various sculptures. The most unique sculptures are of Hari-Hara-Pitamaha-Surya. It decorates the east wall as the centre of the temple. They represent together as Shiva, Vishnu, Brahma and Surya.

Surrounded by four pillars, the Sabhagruha has a raised central altar and a carved Trabeate dome surmounted it. In total, 14 columns of decorative Ghatakam and detailed Dhaarvahakas (load-bearing supports) decorate the Sabhagruha. While the ceiling rises to 14 feet, the height of the pillars ranges from 10 to 12 feet.

Intricate Carvings of the Dome

It is interesting to note that the sanctum sanctorum (Garbhagruha) is an underground room, where two Shiva Lingas have been built. The depth of the underground area can be gauged by the 20 steps down from the top as a little more than 10 feet. From outside, the temple looks solid and is an orderly square, with a roof high above it.

Ancient Indian Architecture

The exterior wall have been sculpted on the stepped and faceted for identification. In total, nearly 250 elephants called ‘Gaj-thar’ cover the temple. The upstairs houses around 70 Shrungara sculpture Muthuna.

Intricate Detailing

Indian mythology believes that the temple was built by the Pandavas during their exile period. Ambernath Shiv Temple is the oldest temple in India. Ambernath suburb is 60 km away from Mumbai city by local train.

Pillars of Strength and Beauty

The historic 11th Century Ambernath Shiv Temple is now a UNESCO heritage structure. The temple is also known as Ambreshwar Shiva Temple. Locally, it is popular as Puratana Shivalaya. The ruins of the temple still speak about great Indian architecture.

Irresistible Architecture

The ASI – Archaeological Survey of India has completely transformed the temple premise with beautiful landscaping and keeping the area restricted as a tourist place to safeguard the ancient beauty.

Jointless Structural Beauty

Apart from spectacular Indian architecture, Ambernath Shiv Temple is also an engineering marvel for being a jointless structural beauty!

Image Courtesy: Johnny D

https://zerobeyond.com/ambernath-shiv-temple-india/

७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी

 ७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी.


 ७ एप्रिल १८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी




इवलीशी काडेपेटी आली कुठून माहितीय का ? अग्नी पेटवण्यासाठी चकमक वापरण्याच्या किचकट मार्गातून सुटका करायला जॉन वॉकर या ब्रिटिश शास्त्रज्ञानं काड्यापेटीचा शोध लावला. माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९५ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. दैनंदिन जीवनात गरजेची ठरलेल्या काडीपेटीचा जगभर वेगानं प्रसार झाला. आजही बहुतेकांच्या किचन ओट्यावर ती हाताशीच ठेवलेली असते. ८० च्या दशकात काडेपेटीच्या वैविध्यपूर्ण कव्हर्सचा संग्रह करायचा अनेक जणांना नाद होता त्यातीलच एक मुलुंडच्या सज्जनवाडीत राहणाऱ्या नंदकुमार देशपांडे यांनी गेल्या ४० वर्षांपासून हा छंद जोपासलाय. त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या तब्बल सहा हजार काडेपेट्या जमवल्यात. त्यात आपल्याकडच्या सर्वात जुन्या 'अनिल' ब्रॅण्डसोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अझरुद्दीन, श्रीदेवी यांची चित्र असलेल्या वैशिष्ठयपूर्ण माचिस आहेत. स्वीडन, इंडोनेशिया, पाकिस्तान, चीन, जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रिया या देशातल्या त्रिकोणी,चौकोनी, आयताकृती अन लिपस्टिक, बॅटरी सेलच्या आकाराच्याही काडेपेट्या त्यांच्या संग्रहात आहेत. त्यातल्या रिकाम्या काड्यांतून आयफेल टॉवरची प्रतिकृती उभारून एका प्रदर्शनात त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं....
आपल्याकडं शिवकाशीला काडेपेटी उत्पादनाचाही मोठा उद्योग आहे. केरळातल्या कोचिमध्येही हे कारखाने आहेत. हजारो लोकांचं पोट या उद्योगावर अवलंबून आहे. अलीकडच्या काही वर्षांत गॅस लायटर्सचं प्रस्थ बरंच वाढलं. धुम्रपानविरोधी मोहीम जगभर सुरू झालीय. त्याचा परिणाम काडेपेटी उद्योगांवर झालाय. वार्षिक तब्बल दीड हजार कोटींची उलाढाल असलेल्या या उद्योगात दहा वर्षांत पंचवीस टक्क्यांनी घट झालीय. माचीस बनवणारे ८ हजार कारखाने बंद पडलेत. पूर्वी आपण पाकिस्तान आणि आफ्रिकेतही माचिस निर्यात करायचो. आता पाकिस्तानमध्ये हा उद्योग सुरू झालाय. त्यांच्या स्वस्त दरामुळं आफ्रिकन देश त्यांच्याकडून काडेपेट्या आयात करतात. आपल्याकडं 'विमको' ही काडेपेटी उत्पादन करणारी प्रमुख कंपनी. त्यांचे 'एम', 'आय नो ', 'होम लाईट','शिप' हे माचीस ब्रँड सर्वांनीच कधी ना कधी हाताळलेत.

https://milindjournalist.blogspot.com/

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...