प्राचीन वाङ्मयांत भूत, किन्नर, राक्षस, गंधर्व, किम्पुरुष, नाग, दानव, इत्यादि बरोबरच यक्षांचा उल्लेख मिळतो. वेद, ब्राह्मण, उपनिषदें, सूत्र, पौराणिक वाङ्मय, जातकादि पालिग्रंथ, जैनांचे आगम साहित्य व संस्कृत कथासरित्सागरादि काव्यकथाग्रंथांत यक्षांचे उल्लेख इतस्ततः पसरलेले आहेत. आज जरी यक्षपूजा उघडपणे मावळली असली तरी निरनिराळ्या प्रांतात लोकोपासनेच्या रूपाने ती आज ही आसेतु हिमाचत प्रचलित आहे. समर्थांनी आपल्या दासबोधांत प्रसंगोपात्त रूपाने ठिकठिकाणी महाराष्ट्रांतील लोकदैवतांचा याद्या दिल्या आहेत. त्यात जाखमाता (यक्षिणीमाता), जखिणी, झोटिंग, वेताळ, मानविणी, सटी, वीरेदेव, मुंज्या, वगैरे पैकी कित्येक जुन्या यक्षमंडळीची नवी संस्करणें आहेत. उत्तरप्रदेशांतील वीर, ब्रह्मा, वगैरे लोकदैवते याच कोटीतील आहेत. अस्तु
यक्षाला पालीत यक्ख व प्राकृतांत जक्ख म्हटले आहे. यक्षाच्या उत्पत्तिविषयी थोडा मतभेद आहे. रामायणांप्रमाणे जलाच्या संरक्षणासाठी प्रजापतीने विशिष्ट सृष्टी निर्माण केली व त्यांना आज्ञा दिली, 'रक्षध्वम्'. त्यापैकी काहीनी सांगितले 'रक्षामः' व काहींनी उत्तर दिले 'यक्षामः'. 'रक्षामः' म्हणणारे राक्षस, 'यक्षमः' म्हणणारे यक्ष झाले. अर्थात् यक्ष आणि राक्षस यांचा गोतावळा एकच होय. ५८
जुन्या काळापासूनच यक्षाच्या दोन प्रकारच्या स्वरूपाची कल्पना केली गेली होती. एक रूप अत्यंत सुंदर अद्भुज सामर्थ्यवान व लोकांचे कल्याण करणारे असे मानले जात असे तर दुसरे रूपांत " बटबटीत डोळे, पसरलेले तोंड, आखुड माण्ड्या, सुटलेले पोट, अशा भयंकर देहाची कल्पना केली जात असे. प्रथम अर्थात अग्नी, इंद्र, कृष्ण बलराम, स्कंद, वगैरे देवांना यक्ष या नावाने संबोधित केले आहे." यक्षांप्रमाणेच यक्षिणी देखील फारच सामर्थ्य असणाऱ्या सुंदर व मायेत पटु अशा स्त्रिया समजल्या जात. बरोबरच याच अर्थात 'यक्षिणीची कांडी' हा मराठीचा वाक्प्रचार आजही रूढ आहे. जुन्या वाङ्मयांत लक्ष्मी, एकानंशा, वगैरे देवी व ताटके सारख्या मायाविनींना यक्षिणी म्हटलेले आहे.
आयुधपुरुष व आयुधस्त्रिया :-
मागील पृष्ठात वेळोवेळी आयुधपुरुषाची चर्चा आलेली आहे, येथे साकल्याने त्यांचा संक्षिप्त आढावा घेतो. विष्णुधर्मोत्तर आणि उत्तरकामिकागमांत वज्र, दंड, खड्ग, पाश, अंकुश, त्रिशूल, पद्म, चक्र, गदा आणि तसेच शंख, भिन्दी (भिन्दीपाल), शर, धनू, यांना मानवाकारात दाखविण्यांबद्दल विधान केले आहे." यात गदा, शक्ती, धनुष्य यांना स्त्रीरूपांत व इतर पुरुषरूपांत दाखवावे असेही सांगितले आहे. मुख्य पुरुषाचे बाजूला आयुधपुरुषाचे स्थान असे ही गोष्ट महाभारतांतील एका उल्लेखानेही सिद्ध होते. अर्जुनाला पाशुपत अस्त्र मिळताच ते 'अग्नीप्रमाणे दैदीप्यमान रूपानें मूर्तिमान होऊन त्याच्या बाजूला (पाश्वें) स्थित झाले' हे वर्णन या दृष्टीनें महत्त्वाचे आहे. "
४०५
कलेत आयुधांचे मानव रूपांत अंकन गुप्तकाळांपासून प्रारंभ झाले व नंतरही ते चालू होते. दक्षिणेपेक्षा उत्तर भारतीय कलेत आयुध पुरुष जास्त दिसतात. मध्यकाळातील शिल्पात एक नवा पायंडा पडलेला दिसतो. तो असा की मुख्य शिल्प किंवा श्रीमूर्ती जर देवीची असेल तर पुरुष रूपांत दाखवली जाणारी आयुधे ही स्त्री रूपांतच दाखवावीत. उदाहरणार्थ महिषमर्दिनी दुर्गेच्या काही प्रतिमांत बाणाचा भाता घेतलेली स्त्री दिसते (भा.क.भ. वाराणसी, सं.सं. १७७, १५३). या उलट मनवा (उ.प्र.) येथून मिळालेल्या विष्णूत हे कार्य करणारा पुरुष आहे. त्याला आपण 'बाण पुरुष' म्हणू शकतो. हीच गोष्ट त्रिशूलाबद्दलही आहे. त्रिशूल पुरुष शंकराबरोबर आढळतो तर त्रिशूल बाहिनी स्त्री कनौजहून मिळालेल्या देवी शिल्पांत आढळते (ल.सं.सं. ५५.२८७रे. चि. आठ १). आजपर्यंत एकूण आपल्याला खालील आयुधे पुरुष किंवा स्त्रीरूपांत मिळाली आहेत :
१) गदा : एक अपवाद वगळल्यास स्त्रीरूपांत (र.चि. सात ४).
२) चक्र : पुरुष रूपांत (रे.चि. सात ६)
३) शंख: पुरुष रूपांत, पण कचित स्त्री रूपांत (चित्र १७०)
४) पद्म: पुरुष रूपांत, पण कमीच
५) खड्ग: पुरुष रूपांत, कमीच विशेष करून देवगढच्या अनन्तशायी प्रतिमेत (रे.चि. नऊ २)
६) त्रिशुल : पुरुष रूपांत (र.चि. आठ २, ६) पण सिंहवाहिनी देवीच्या हातात एका शिल्पांत स्त्री रूपांत." (रे.चि. आठ १) याशिवाय दक्षिण भारतीय धातुप्रतिमांतही त्रिशूलाच्या मध्यभागांत त्रिशूल देवी आढळते."
७) खट्वांग : पुरुष रूपांत, (रे.चि. नऊ १) पण मोजक्या शिल्पांतच दिसते.
८) शक्ती : कार्तिकेय प्रतिमांत ही स्त्री रूपांत दिसते. (रे.चि. आठ ७)
९) धनुष्य आणि बाण: शास्त्रीय विधानाप्रमाणें स्त्री रूपांत व बाण पुरुष रूपांत असावयास पाहिजे, पण मनवा (सीतापूर जिल्हा उत्तर प्रदेश) येथून मिळालेल्या एका विश्वरूप विष्णूच्या प्रतिमेत दोघेही पुरुष रूपातच दाखविले आहेत. (रे.चि. आठ ४,५)
१०) वज्र : काही विद्वानांच्या मते राजा माउएस (Maues) च्या नाण्यांवर वज्रपुरुष दिसतो. पण हे विधान स्वीकारतांना लक्षांत असू द्यावे की हा राजा बराच आधीचा आहे. वेरुळ येथील बौद्ध लेण्यांत वज्रपाणीचा आयुधपुरुष म्हणून वज्र पुरुष दिसतो. (या माहितीसाठी लेखक नागपूर विद्यापीठाचे डॉ. जी. बी. देगलूरकर यांचा आभारी आहे.)
समुद्र :-
उत्तर भारतात कित्येक ठिकाणी मध्यकालीन मंदिराच्या उंबऱ्यांच्या खालच्या बाजूस पायशिळेवर दोन दोन पुरुष सर्व अलंकार घालून हातात घागरी घेऊन बहुतेक मगरावर बसलेले दिसतात. (रे.चि. बेचाळीस १) हे चार पुरुष म्हणजे चार समुद्र होत. ते गर्भगृहांतील देवाचे पाय धुण्यास उपस्थित झालेले असतात. मानरूपी चार समुद्रांचा उल्लेख हरिवंशात आढळतो. हे चार समुद्र म्हणजे दधि, क्षीर, लवण आणि मधु समुद्र असावेत. कालिदासाने पृथ्वीचे वर्णन करतांना देखील 'चतुस्समुद्रांतसलीलमेखला' असे शब्द घातले आहेत. शिलालेखांत ही असे वर्णन आढळते.
४०६
इहामृग, किन्नर, सुपर्ण वगैरे :-
कित्येक शिल्पांत अर्धा मानव अर्घा पशु अथवा अर्घा मनुष्य तर अर्धा पक्षी, अथवा पशूत पक्ष्याचे किंवा पक्ष्यांत पशूचे मिश्रण केलेले दिसते. शुंग कुषाण कलेत हे खूपच आढळतात. पुढे मात्र रोडावत जातात या काल्पनिक जीवाना इहामृग, कित्रर, सुपर्ण, वगैरे नावांनी ओळखतात (रे.चि. चाळीस १-३).
हरिहर पुत्र, आर्य :-
मागे हरिहराचे विवेचन करीत असताना मोहिनीचे रूप घेतलेल्या विष्णूच्या पाठीमागे शंकर लागला या कथेचा उल्लेख केलेला आहे (पान १४९) द्रविड परंपरेप्रमाणे त्या उभयतांच्या संयोगापासून जो पुत्र झाला त्याला मल्याळम मुलुखाचे स्वामित्व मिळाले. हा हरिहर पुत्र, आर्य, ऐय्यनार, किंवा शास्ता या नांवाने प्रसिद्ध आहे. उत्तरेला मुळीच माहीत नसलेला हा देव मल्याळी लोकांचा लाडका आहे. ज्याप्रमाणे तमिळ देशांत सुब्रह्मण्याची भरपूर मंदिरें आहेत. त्याचप्रमाणे मल्याळम् देशाच्या प्रत्येक शैव किंवा वैष्णव मंदिरात शास्ता असतोच.
आगमग्रन्थांप्रमाणे शास्त्याला चार हात असून सामान्य हात अभय आणि वरद मुद्रेत असावेत आणि मागच्या हातात खड्ग व ढाल ही आयुधे द्यावीत काहीच्या मते तो फक्त दोनच हाताचा असावा व त्याच्या हातात वाकलेली काठी (तमिळ-शेण्डु) आणि फळे व पार्ने असावीत. हा मांडी घालून बसलेला किंवा सुखासनात असावा. शास्त्याच्या प्रतिमा अर्थातच त्याच भागांत मिळतात, पण नुकतीच त्याची एक प्रतिमा वाराणसीत दक्षिण भारतीय लोकांनी स्थापित केली आहे.
देवपट्ट/तीर्थपट्ट :-
साधारणपणे आपण शिल्पांत एकट्या दुकट्या किंवा वाहन, सेवक, गंधर्व, व इतर परिकर मूर्तीसह उत्कीर्ण अशा मोठ्या लहान प्रतिमा आपण पाहतो. याशिवाय नवग्रह, सप्तमातृका, दशावतार वगैरेचे सामूहिक अंकन करणारे शिलापट्ट ही दिसतात. या सर्वां व्यतिरिक्त शिल्पांत एक वेगळा प्रकार ही आढळतो. येथे संपूर्ण तीर्थाचे प्रातिनिधिक अंकन हा मुख्य विषय असतो. क्वचित थोडे विषय परिवर्तन ही आढळते. अशा पट्टाची आपण येथे संक्षिप्त चर्चा करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट अशी की वाराणसी पट्टाशिवाय इतरांची फक्त एक एकच शिल्पेंसमोर आली आहेत. असो.
वाराणसीपट्ट :-
मध्यप्रदेशातून मिळालेला सुमारे ११-१२ शतकांतील हा चौकोनी शिलापट्ट ग्वाल्हेरच्या गूजरीमहाल संग्रहालयांत होता. तो आतां भोपाळ संग्रहालयात गेला आहे असे ऐकतो (रे.चि.दे.१) हा आडव्या रेषेत चार भागांत विभागलेला आहे. मधोमध खालून वर जाणारी एक नदी आहे. ही गंगा, गंगेचे नदी रूपात अंकन इतरत्र आढळत नाही. पटाच्या अगदीवर किंवा वरून पहिल्या भागात ओळीने १४ शिवलिंगे आहेत. वरून दुसऱ्या भागांत नदीच्या उजव्या बाजूला सात सूर्य, डाव्या बाजूला दोन उपासकांसह प्रलंब पादासनांत बसलेला शिव असून उरलेला भाग पुनः दोन आडव्या भागांत वाटलेला आहे. वर पाच चौकोनी शाळुकांत प्रत्येकी पाच अशी एकूण २५ लिंगे आहेत. खाली काही देवमूर्ती आहेत. वरून तिसऱ्या भागांत गंगेच्या उजवीकडे सहा विष्णू आहेत. डावीकडे ललितासनांत बसलेली देवी हातांत दंड घेऊन बसलेला पुरुष आणि त्या पलीकडे पुनः सहा विष्णू आहेत. अगदी खालच्या भागात पाच गणपती, बसलेले स्रीपुरुष व कलश, माळा घेतलेले सेवक दिसतात. नदीत मगर, मासा, कासव वगैरे जलचर आहेत.
४०८
भुवनदेवाचायनि आपल्या अपराजितपूच्छा या ग्रंथात (अपरा. ७४.२०-२५ पा. १८४-८५) 'पट्टशाला वाराणर्मा या नांवाने वाराणसीच्या अंकनाची चर्चा करीत असे विधान केले आहे की अशा पट्टाचे पूजन केल्यास प्रत्यक्ष गंगास्नान कात्याचे पुण्य मिळून मोक्षप्राप्ती होते. या उल्लेखाचा आधार घेऊन स्कंद पुराणांतील काशीखंडात नमूद केलेल्या याश क्रमांतील देवतांचा तुलनात्मक विचार केला तर या शिलापट्टाचा बराचसा उलगडा होतो.
पहिली १४ लिंगे काशीतील १४ 'सिद्धलिंगे' किंवा 'महालिंगे' आहेत. यांच्या चार याद्या मिळतात. पाच शाळुंकातील २५लिंगे शंकराच्या 'पञ्चविंशति तत्त्वात्मा' या नांवाची सार्थकता दाखवतात. सात सूर्य हे काशीतील बारा आदित्यांचे प्रतिनिधी असावेत. त्याचप्रमाणे १२विष्णू हे तेथील आदिकेशवादि बारा केशव आणि पाच गणपती तेथील पंच विनायक आहेत. यांच्या ही पाच याद्या मिळतात. अपराजितपृच्छेप्रमाणे गंगेच्याजवळ बसलेली देवी स्वतः वाराणसी आहे. काशी खंडात हिला 'विग्रहवनी वाराणसी' असे संबोधन आहे. तिच्याजवळ दंडपाणी शिवाचे स्थान युक्तिसंगत आहे (रे.वि.दे. १-३)
वाराणसीचे शिलापट्टीय अंकन पुण्यप्रद ठरल्यानंतर असे पट इतरत्र ही निर्माण होत असावेत हा तर्क क्रमप्राप्त आहे. व तो खरा ही ठरतो. स्थूल रूपाने या देवताच्या बरोबर इतर ही देवतांचे अंकन करणारे दोन पट झाशी येथे राणीमहाल संग्रहालयांत आहेत. यांत 'वाराणसी' आहे. पण गंगा 'नदी' मात्र नाही. (रे.चि.दे. २,३) एवढेच नव्हे तर वाराणसी पटाला आधार घेऊन पण केन्द्रीय देवतेचे मात्र परिवर्तन दाखवणारे इतर ही काही पट तयार करीत असत असे दिसते. कालंजर (बांदा) उ.प्र. येथील 'वैकुंठ पट्ट' (रे. चि.दे.४) लखनऊ संग्रहालयात असलेला फक्त अर्धा असा विष्णूपट्ट, विदिशा संग्रहालयांत विद्यमान एक खंडित पट्ट अशी काही उदाहरणे दाखवता येतील. (रे.चि.दे.४)
N.P. Joshi, Varanasi Silapattas and Somilar slabs in Medi...... sculptures of Central India, S.S. II, 1989, pp. 143 ff.
त्रिपुरी पट्ट :-
जबलपुर, मध्यप्रदेश जवळील त्रिपुरी या नर्मदातटावरील क्षेत्राचे अंकन करणारा हा पट देखील अशाच प्रकारचा आहे. पटाच्या तीन बाजूला धावणारी नर्मदा व तिच्यातच तिची लहानशी मूर्ती देखील आहे. मुख्य दोन अंधकासुराचा वध करणारा शिव 'अंधकासुरवध मूर्ती' च्या रूपांत आहे. नर्मदेच्या नागमोडी प्रवाहांत सहा शिवलिंगे आणि खाली आडव्या रेषेत विभागलेल्या पाच भागांत विष्णू, नंदीवर उमामहेश्वर, देवी, गणपती, दिक्पाल, नाग, वगैरेची अंकने आहेत. (र.चि.दे.५)
V.S. Pathak and S.K.Sullerey, Tripuri Tirtha-patta, a sculptures mythical representation of Tripuri, Art of Kalachuris
For illustration - P.K. Agrawala, Dr. XXXIX, 2, 1977, pl. 14, p. 151
प्रयागपट्ट :-
मध्यभारतांत मिळालेल्या (तूर्त ब्रिटिश म्यूझियम, लंडन) सुमारे ९-१० व्या शतकाचा हा पट महत्त्वाचा आहे (रे.चि.दे.६) यांत मुख्य आकृती एका सुंदर मत्स्याची आहे. मत्स्याच्या पाठीवर एक स्थंडिल आणि त्यावर शंकराची घट घेतलेली आवक्षमूर्ती आहे. तिच्या डोक्यावर शिवलिंगाचा भाग दिसतो. हे लिंग एका विशाल झाडाखाली आहे. हा वटवृक्ष असावा, कारण शिवाचे आणि वडाच्या झाडाचे जवळचे संबंध आहेत. लिंगाच्या आजुबाजूला सेवक, सेविका दिसतात. लिंगाच्या डावीकडे एक भला मोठा त्रिशूळ उभा आहे. झाडावर एक पुरुष चलायमान स्थितीत दिसतो.
४०९
सवाबीच पुनः त्रिशूळाच्या टोकावर झेप घेणारी अधोमुख आकृती दिसते. अर्थात् झाडावरून विशूळावर उडी टाकून आत्महत्या करण्याचे हे उघड दृश्य आहे. या अंकनासगट सम्पूर्ण पट आठ आडव्या भागात वरून विशळावर उदी चाकान प्रिरनिराळे देवादिक विद्यमान आहेत. यांत शेषशायी विष्णु, अग्री, बाळासह मातृका, कुंभोदर यक्ष, वायू, बसलेला तपस्वी, सूर्य, ऋषी, कुबेर, पंख पसरलेला गरुड, यज्ञ वराह, आठ नाग, समुद्र, वगैरेचा समावेश आहे. अगदी खालच्या भागांत डाव्या टोकाला दोन सारखे घट आहेत, पण त्यापैकी एकावर सर्प दिसतो.
एकूण या शिलापट्टावर अंकित असलेली दृश्यें प्रमुख मत्स्य व इतर देवतासंघ याचा परस्पर कार्यकारणभाव समजून लेण्यांस पुराणाची मदत घेणे अपरिहार्य आहे. त्याची एक किल्ली आत्महत्येच्या दृश्यात आहे. सामान्यतः आत्महत्या कारणे हे घोर पाप मानले जाते, पण त्याला प्रयागक्षेत्र हे अपवाद आहे. तेथे अग्रीत प्रवेश करून, झाडावरून उडी टाकून, पाण्यात प्रवेश करून, वगैरे पाच प्रकाराने देहत्याग करणे पुण्यकार्य समजतात. तेथे असलेल्या अक्षयवटावरून उड़ी ठाकणे (भृगुपतन) या प्रकाराचे येथे अंकन आहे. मत्स्याचा आणि प्रयाग क्षेत्राचा संबंध सांगणारी कथा स्कंदपुराणाच्या वैष्णव खंडात (स्कंद वैष्णव., १३.२४-४८) आणि पद्मपुराणांत (पद्य, उत्तरखंड, अध्याय ९१-९२) आहे. संक्षेपात विष्णूने मत्स्यावतार घेतला, शंखासुराचा वध केला व त्यानंतर बदरीवनाला जाऊन त्याने ऋषीगणांना समुद्रांत हरवलेले वेद शोधून त्यासह प्रयागला येण्यांस सांगितले, व स्वतः देखील तेथे गेला. ठरल्याप्रमाणे वेदांचा संग्रह करून यज्ञासह सर्व प्रयागला आले. संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाने तेथे 'प्रकृष्टयागा'ची व्यवस्था केली म्हणून या क्षेत्राला 'प्रजापतिक्षेत्र' किंवा 'प्रयाग' अशी नांवे मिळाली. वर दिसणारा पंख पसरलेला गरुड आणि खाली डाव्या टोकावर असलेले दोन घट यांचा संबंध गरुडाने आपल्या आईला विनतेलस कद्रूच्या दास्यातून सोडवण्यासाठी स्वर्गातून आणलेला अमृतकुंभ व नंतर नरागांना तो मिळू नये एवढ्यासाठी इन्द्राने तो पळवून त्याचे ठिकाणी विषकुंभ ठेवण्याच्या कथेशी आहे (पद्म. सृष्टी., अध्याय ४९, महाभारत, आदि, अध्याय ३४, वगैरे) प्रयाग क्षेत्राचे अंकन करणारा दुसरा पट्ट आमच्या पाहण्यात नाही. (रे.चि.दे.६)
-नी.पु. जोशी, 'तीर्थावतार पट्ट के रूप में प्रयाग का अंकन',
प्राग्धारा, १,१९९०-९१, पृ.१५-२१, चित्र १-७.
N.P. Joshi Aksaya....... pp. 203-12
अंतरिक्ष / व्योमपट्ट :-
धुबेला संग्रहालय (छतरपुर), म.प्र. येथे असलेला सुमारे १०-११व्या शतकातील हा पट्ट अगदी निराळ्या स्वरूपाचा आहे. येथे कोणत्याही तीर्थाची मांडणी नसून आकाशातील देवतांचे वर्तुळाकार अंकन आहे. मूळ दगड चौकोनी आहे. पण त्याचा वरील डावा कोपरा तुटलेला आहे. मधोमध एक पोकळ गोल भोक असून त्याच्या भोवताल एक रूंद वर्तुळ आहे. याच वर्तुळात स्थूल रूपाने तीन रांगात आकाशांत प्रत्यक्ष दिसणारे, तसेच अप्रत्यक्ष पण पुराणादिकांत उल्लेख असलेले देवतागण दाखवले आहेत. यांत मेषादि दहा राशी, सूर्यासह नवग्रह, बैलाचे तोंड असलेले आठ वसू, दोघे अश्विनी कुमार, स्पष्टपणे ओळखता येतात. ध्रुव आणि त्याच्या भोवती फिरणारे सप्तर्षी ही दिसतात. या शिवाय खाली नमूद केलेल्या काही अंकनांची तकनि संगती लावता येते. केंद्रात असलेली शून्याकार पोकळी. ही आकाशाची द्योतक असावी, कारण आकाश म्हणजे संपूर्ण पोकळी. शिवाय आकाशाचे 'शून्य' असेही एक नाव आहे.
४१०
भला मोठा शंख : -
पंचमहाभूतांपैकी आकाश हे प्रथम भूत असून 'शब्द' ही त्याची तन्मात्रा आहे. शब्द किंवा ध्वनी या तन्मात्रेचा द्योतक हा शंख वाटतो. तसा शंखाचा आकाशाशी प्रत्यक्ष संबंध नाही.
त्रिशंकु :-
नमस्कार मुद्रेत बसलेल्या दोन स्रियांच्यामध्ये पाठमोरा बसलेल्या पुरुषाला 'त्रिशंकु' म्हणता येईल. वाल्मीकीय रामायणांत त्रिशंकुची कथा आहे. (वा.रा., बाल.अ.६) इक्ष्वाकु वंशातील या राजाला विश्वामित्राने आपल्या तपसार्मथ्याने सदेह स्वर्गाला पाठवले. इंद्र रागावला व देव त्याला खाली लोटू लागले. विश्वामित्राने त्याला तेथे तसेच थांबवले व स्वतः प्रतिसृष्टी निर्माण करू लागला. आतां देव घाबरले, तडजोडीची भाषा सुरु झाली. शेवटी विश्वामित्राने तोपर्यंत केलेली प्रतिसृष्टी तशीच राहील व त्रिशंकुही तशाच रूपात पण देवत्वाच्या सन्मानासह स्वर्गात राहील. या अटीवर तडजोड झाली. या कथेच्या आधारावर लोटला जाणारा म्हणून पाठमोरा, पण देवस्त्रियांकडून नमस्कृत दिसणाऱ्या या पुरुषाला 'त्रिशंकु' म्हणून ओळखता येईल.
तीन मानव पाउलें : -
यांना ओळखण्याचे दोन पर्याय देता येतील. एक तर ऋग्वेदांतील पुरुष सूक्तांत (ऋ. १०.९०.३) म्हटल्याप्रमाणे विराट् पुरुषाची 'दिव' येथे असणारी तीन पाउलें (त्रिपाद तीन चतुर्थांश भाग = पर्यायाने पाउलें) असावीत. दुसरे समाधान खगोल शाखाच्या आधारे देता येईल. या शास्रात 'श्रवण' नक्षत्राचे रूप 'एका ओळीत उभी माणसाची तीन पाउलें' असे दाखवतात (गुणाकारमुळे, तारों भरा आकाश, दिल्ली, २००४, पान ७४ नक्षत्रांच्या आकृती).
छोट्या वर्तुळाभोवती सात पुरुष :-
हे ध्रुवाभोवती फिरणारे सप्तर्षी असावेत. हा ध्रुव म्हटला तर ही उत्तर दिशा ठरते. व येथून वर डावीकडे म्हणजे पूर्वेकडे सूर्य (इतर आठ ग्रहांसह) आढळतो.
या व्योयपट्टातील इतर अंकनाची संयुक्तिक ओळख पटलेली नाही, पण खाली मोठ्या वर्तुळाबाहेर दिसणारे नमस्कारात बसलेले दोघे जण दिसतात. अर्थात् हा पट्ट पूजनीय व वंदनीय असा आहे.
वाङ्मयाकडे वळलो तर विष्णुधर्मोत्तर पुराणांत (वि.ध. खखख.७५.१-९) 'सर्वदेवमय' अशा 'व्योमरूपा'चे वर्णन असून त्याची पूजा म्हणजे सर्व 'चराचरा'ची पूजा असून ती 'सर्वकामाना (इच्छाना) पूर्ण करणारी आहे. असे असले तरी त्या व्योमस्वरूपाचा आपल्या व्योमपट्टाशी जोडता येणार नाही. कारण दोघांचे आकार व मांडणी अगदी वेगळी आहे. फक्त एवढेच म्हणता येईल की या पुराणाच्या काळापासून (सुमारे ६-७वे शतक) व्योमाकाराचे निर्माण व त्याचे पूजन लोकमान्य होते.
हे.
गुढ शिल्पे (गोकुळेश्वर, चारठाणा)
काही मंदिरांवर तंत्रमार्गी, अघोरपंथी, शाक्तपंथी अशी शिल्पे कोरलेली आढळून येतात. त्यांचा अर्थ त्या संप्रदायातील एखाद्या कृतीशी निगडीत असतो. पण सामान्य दर्शकाला मात्र कळत नाही.
हे शिल्प चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथील गोकूळेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावरील आहे. यात एकुण पाच मानवी आकृती दिसून येतात. पण पाय मात्र ८ आहेत. दोन्ही टोकाच्या दोन स्त्रीया आहेत. अगदी मधला पुरूष आहे. पण त्या बाजूचे दोन कोण हे चटकन कळत नाहीत. कारण त्यांचे केस स्त्रीयांसारखे मागे बांधलेले आहेत. पण छाती सपाट दाखवली असल्याने त्यांना स्त्री संबोधता येत नाही.
मधल्यांनी बाजूच्यांच्या डोक्यावर हात ठेवले आहेत. शिवाय सर्वात मधल्याचे वाटणारे दोन्ही हात बाजूच्या स्त्रीयांच्या हातात आहेत. हेच हात मधल्या पुरूषांचेही भासतात. पायासोबतच हाताचीही संख्या आठच आहे.
यातील टोकाच्या स्त्रीया स्वतंत्र आहेत. मधले तीनही एकमेकात अडकलेले आहेत. एक तर्क असा मांडता येतो. पुरूषाच्या उजव्या बाजूस त्याची शक्ती असते आणि डाव्या बाजूस पत्नी (वामांगी). बहूतेक देवतांच्या बाबत हे शिल्पांकित केलेले आढळून येते. येथे सामान्य पुरूषाच्या बाबतीतही हे सुचित केले असावे. आणि आज कार्टून काढताना जशी चलचित्र (animation) काढली जातात तसे उजवीकडचे चित्र पहिले, दूसरे चित्र दोन्ही स्त्रीयांचे हात हाती घेतलेले. आणि तिसरे मग पूर्णत: डावीकडच्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला असे. मधला पुरूष एकच असावा. फक्त तीन अवस्थांत दाखवला आहे. याला एक गती आहे. ही नृत्यातीलही एक गतीमान अशी मुद्रा असू शकते. कारण डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात टिपरी सारखे काही दिसत आहे.
याचा तंत्रमार्गातही काही वेगळा अर्थ असू शकेल. केसांची आणि पायांची रचना यातून पुरूषांत स्त्रीचा अंश आहे असेही सुचवायचे असावे.
तूमच्या सारख्या अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. Dr-Arvind Sontakke हे तूम्हा अभ्यासकांना आव्हान ठरणारे विषय आहेत.-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575.
होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिरांचा विविध पैलूंनी बारीक विचार झाला पाहिजे. आता हे जे शिल्प आहे ते गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील तोरणाचे आहे. समोरून पाहताना हातात माळा घेतलेले यश किन्नर दिसतात. त्यांच्या हातातील माळांची सुरेख अशी नक्षी बनलेली आढळून येते. या भागात सहसा अंधार असतो त्यामुळे संपूर्ण शिल्पाकडे लक्ष जात नाही. पण या तोरणावर प्रकाश टाकला आणि खालची बाजू बघितली तर आपण चकित होतो. हे शिल्प 3D आहे. आपल्याला दिसते ती छाती पासून वरची बाजू दर्शनी प्रतलात आहे. पण कमरेपासून खालची बाजू दूसर्या प्रतलात आहे. ९० अंशाचा कोन करून या मानवी आकृत्या वळवलेल्या आहेत. शिल्पकलेतील हे मोठं आव्हानात्मक काम आहे. अशाच पद्धतीने द्वारशाखेवर नृत्य करणारे स्त्री पुरूष दाखवलेले आहेत. म्हणजे शिल्पकलेत एकाच प्रतलाचा वापर न करता दोन दिशा दोन प्रतलात शिल्प कोरलेली आढळून येतात. हे केवळ सौंदर्यपूर्णच आहे असे नाही तर गणिताचा अभ्यास करून निर्माण झालं आहे.
प्राचीन मंदिरांबाबत अशा काही बाबी खरंच आचंबीत करतात. वास्तुशास्त्र, शिल्प सौंदर्य, विज्ञान, गणित असा अद्भुत संगम इथे पहायला मिळतो. दगडाची प्रतवारी शोधून मगच शिल्प कोरले जाते. दगडी चिर्यांची रचना नुसती सौंदर्यपूर्ण नसते तर त्यात शास्त्रही सांभाळलेले असते.
अशा अवघड जागी वर चढून फोटो काढल्या बद्दल धन्यवाद मित्रा.घोटण (ता. शेवगांव, जि. नगर) येथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावर पशु पक्षांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं असल्याचे याच मालिकेत पूर्वी लिहिलं होतं. याच मदिराच्या स्तंभांवर युद्ध आणि युद्ध सराव अशी काही शिल्पे आढळून आली. ही शिल्पे पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या शिल्पात तलवार घेवून लढणारे दोन योद्धे दिसत आहेत. त्यांनी शिरस्त्राण घातलेले आहेत. प्रत्यक्ष युद्धापेक्षा हा युद्ध सराव असावा. दूसरे शिल्प कुस्तीचे आहे. खेळा सोबतच युद्धाची तयारी म्हणून प्रशिक्षणाचा भाग असावा.
तिसर्या शिल्पात हत्ती आणि घोडा आहे. हत्तीने सोंडेत एक माणूस पकडला आहे. समोरचा घोडा उधळलेला आहे. हत्तीवर माहूत नाही. प्रत्यक्ष युद्धातीलच एक क्षण शिल्पात फोटोसारखा पकडला आहे. चौथे आणि शेवटचे शिल्पही असेच गतीमान आहेत. यात दोन अश्वस्वार दिसत आहेत. दोघांच्याही हातात भाले दिसत आहेत. दोघांच्या मध्ये जमिनीवर एक योद्धा आहे. घोडे मागील दोन पायांवर आहेत. युद्धाचा जोर इथे दिसून येतो. वीररसात ही शिल्पे न्हावून निघाली आहेत.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575
पुणे परिसरातील योग-साधना व संबंधित शिल्पे
Travels
and tourism, History and culture, Archaeology, Anthropology, Folk
culture, Yoga, Hindi literature, Environment, Geography, Manuscripts,
Iconography etc.
आधुनिक
जीवनशैलीमुळे आरोग्यसंबंधीच्या निर्माण झालेल्या अनेक समस्या तसेच
दिवसेंदिवस वाढत चाललेला ताण-तणाव, यांवरती उपाय म्हणून योगसाधनेकडे जग
मोठया आशेने पाहत आहे. दैनंदिन जीवनात आरोग्य विषयीचे महत्त्व आपल्या
पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच ओळखले होते. यासाठी त्यांनी योगसाधनेला आपलेसे
केले. अनेक ऋषी-मुनींनी योगविद्येच्या बळावर आपले व इतरांचे जीवन
आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न केला. जागो-जागी असणारे सांप्रदायिक मठ तसेच
गुहा-कंदरांमध्ये ही साधना चालत असे. वरचेवर यात नवनवीन प्रयोग झाल्याने
ही विद्या भरभराटीस आली. कित्येक प्राचीन मंदिरांवरती शिल्पकलेच्या रुपात
आपल्याला याचे पुरावे मिळतात.
आपला
हा प्राचीन वारसा अनेक ग्रंथ व मौखिक परंपरेने तर जपला गेला आहेच, परंतु
हा एवढया पुरताच मर्यादित न राहता शिल्पकलेच्या माध्यमातूनही जोपासण्याचा
प्रयत्न झाला. योगविषयीची अनेक आसने, मुद्रा, प्राणायामांचे प्रकार
शिल्पबद्ध केले गेले. पुणे परिसरात व जिल्ह्यात इतरत्र अशा प्रकारची शिल्पे
व अवशेष आपल्याला पहावयास मिळतात.
आज
पुणे शहरातील ‘अय्यंगार योग संस्था’ तसेच लोणावळ्यातील ‘कैवल्यधाम’ व
‘लोणावळा योग संस्था’ योगविद्येच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत असल्या
तरी, ही परंपरा पुण्यासाठी नवीन नाही. इसवीसन १७५४ ते १७७० या काळात सोमवार
पेठेत बांधल्या गेलेल्या त्रिशुंड गणपती मंदिर व मठात योगविद्येची साधना
केली जात असे. साधकांना योग्य प्रकारे साधना करता यावी म्हणून विशिष्ट
खोल्यांची रचनाही येथे केली गेली होती. येथे ‘धुम्रपान’ नावाची एक विशिष्ट
साधना होत असे. त्यामध्ये हठयोगाचे साधक स्वतःला छताला उलटे टांगून घेत व
खाली निखाऱ्यामध्ये काही औषधी वनस्पती टाकल्या जात व त्यापासून निघालेला
धूर ते नाकाद्वारे घेत असत. यामध्ये संभवतः दशनामी गोसावी पंथातील साधक
हठयोगाची साधना करीत. येथे काही योगसाधकांच्या समाध्याही आहेत. अशा या
योग-स्मारकाचे संवर्धन करून त्याचा विकास करणे अगत्याचे आहे.
पुण्यापासून
साधारणतः ५४ किमी अंतरावर पिंपरी-दुमाला नावाचे गाव आहे. येथील सोमेश्वर
मंदिरावर कुंडलिनी योग विषयीचे महत्त्व सांगणारे दुर्मिळ शिल्प आहे. सुमारे
सातशे वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेले. या
मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर संभवतः आदिनाथांची एक अतिशय दुर्मिळ
प्रतिमा आहे. आदिनाथ अर्थात शिव. यामध्ये ते समाधिस्थ योगीच्या रुपात
साकारले गेले असून ते
पद्मासनात बसले आहेत. त्यांचा उजवा हात ‘सूची’ मुद्रेत आहे. सर्वात
वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे शिल्पकाराने त्यांच्या डोक्यावर अर्धवट
उमललेले कमळ दाखविले आहे. हे कमळ योग साधनेत खूप महत्त्वाचे प्रतिक मानले
जाते. मानवी शरीरात कुंडलिनीरूपाने ‘शक्ती’ सुप्त अवस्थेत असते तसेच
मस्तकातील सहस्रारांत शिवाचा निवास असतो. कुंडलिनीचा प्रवास मेरुदंडाजवळील
मूलाधार चक्रापासून सुरु होऊन त्यानंतर स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र,
अनाहत चक्र, विशुद्धाख्य चक्र आणि आज्ञा चक्र अशा सहा चक्रांना ओलांडून
सहस्रारांत संपतो. योगी ह्या कुंडलिनीरुपी शक्तीला जागृत करून सुषुम्ना
नाडीच्या माध्यमातून शक्ती व शिवाचे मिलन सहस्रारांत घडवून आणतो आणि हे
सहस्रार रुपी कमळ उमलले जाते अर्थात योग्यास परमानंदमय समाधी प्राप्त होते.
असे हे अनन्यसाधारण शिल्प येथील मंदिरावर कोरण्यात आले आहे. पुणे परिसरात
योगसाधनेचा प्रचार-प्रसार किती मोठ्या प्रमाणात झाला होता याचे हे उत्तम
उदाहरणच होय. सोमेश्वर मंदिरांवरील या शिल्पांमध्ये नाथ संप्रदायातील इतर
हठयोगीही दाखविले आहेत. यामध्ये मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांची शिल्पे या
भागात दुर्मिळच म्हणावी लागतील. योगसाधनेच्या उज्ज्वल परंपरेमध्ये
पिंपरी-दुमाला येथील मंदिरावरील हठयोगाच्या महान गुरूंची शिल्पे राष्ट्रीय
संपदा ठरावीत अशी आहेत.

कुंडलिनी योग संबंधीचे शिल्प, पिंपरी-दुमाला
कुंडलिनी
योगाचे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथात भरपूर विवेचन केले आहे. आळंदी येथे
इंद्रायणी काठी तर ८४ सिद्धांचा मेळा भरत असे. या सिद्धांपैकी काही सिद्ध
हे हठयोगी होते. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील नाथ-योग्यांच्या समाध्या आजही ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पहावयास मिळतात.
पुण्यापासून साधारणतः ५४ किमी अंतरावर प्रसिद्ध असणाऱ्या
प्राचिन भुलेश्वर मंदिरातही सिद्धांची बरीच शिल्पे आहेत. त्यांना पद्मासन,
सिद्धासन यांसारखी विभिन्न आसने व मुद्रांमध्ये दर्शविले आहे. किंबहुना
येथील एक सुंदर शिल्प विशिष्ट अशा द्विपादशिरासनात असून साधकाने यात आपल्या
पाठीमागे दोन्ही पाय एकमेकांत अडकविले आहेत.

द्विपादशिरासन/पाशिनी मुद्रा, भुलेश्वर मंदिर
जुन्नरपासून
साधारणतः १० किमी अंतरावरील पारुंडे गावातील ब्रह्मनाथ मंदिराच्या
खांबांवरती विविध ध्यान-धारणा व आसनातील अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. उर्ध्व-धनुरासन,
गरुडासन, नौकासन, प्रसारित-पादोत्तानासन, गोमुखासन, पाद-पश्चिमोत्तानासन,
अनंतासन, अर्ध-मत्स्येन्द्रासन, क्रौंचासन अशा किती तरी आसनांचे प्रकार
येथे कोरले गेले आहेत.

पाद-पश्चिमोत्तानासन, ब्रह्मनाथ मंदिर, पारुंडे
येथूनच
पुढे हरिश्चंद्रगडावर प्रसिद्ध योगी चांगदेव यांनी ‘तत्त्वसार’ नावाचा
ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे हा परिसर एकेकाळी योग साधकांच्या गर्दीने
फुलून गेलेला असावा असे दिसते. अशा
या दर्जेदार वारशामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच योगसाधनेच्या
परंपरेतही पुणे परिसर व जिल्ह्याचे महत्त्व ठळकपणे दिसून येते.
योग
विद्येचे जागतिक महत्त्व ओळखून या स्थळांचे व्यवस्थितरित्या संगोपन व
संवर्धन होणे गरजेचे आहे. योगसाधनेच्या परंपरेत आपणासही असा प्राचीन वारसा
लाभला आहे, याचा अभिमान सर्वांनी बाळगायला हवा. या अवशेषांचे अस्तित्त्व
टिकून राहणे म्हणजे आपले व आपल्या पूर्वजांचे अस्तित्त्व टिकून
राहण्यासारखे आहे. हा अनमोल ठेवा नाहिसा होण्याअगोदर त्याची माहिती सर्वदूर
पोहोचवून त्याचे महत्त्व जगासमोर मांडणे गरजेचे आहे. संपूर्ण विश्व
योगसाधनेला जवळ करीत असताना आपणही या निमित्ताने आपल्या पूर्वजांप्रमाणे
योगविद्येला अंगीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवायला हवे. आपल्या
भारतीय योगपरंपरेचे हे प्राचीन दुर्मिळ पुरावे निश्चितच संपूर्ण जगासाठी
मार्गदर्शक व प्रेरक ठरतील व आपल्या पूर्वजांचे महान कार्य शिल्परूपाने
बोलू लागतील.
कुंडलिनी योगाचे ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथात भरपूर विवेचन केले आहे. आळंदी येथे इंद्रायणी काठी तर ८४ सिद्धांचा मेळा भरत असे. या सिद्धांपैकी काही सिद्ध हे हठयोगी होते. ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील नाथ-योग्यांच्या समाध्या आजही ज्ञानेश्वर मंदिर परिसरात पहावयास मिळतात.
येथूनच पुढे हरिश्चंद्रगडावर प्रसिद्ध योगी चांगदेव यांनी ‘तत्त्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळे हा परिसर एकेकाळी योग साधकांच्या गर्दीने फुलून गेलेला असावा असे दिसते. अशा या दर्जेदार वारशामुळे सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांबरोबरच योगसाधनेच्या परंपरेतही पुणे परिसर व जिल्ह्याचे महत्त्व ठळकपणे दिसून येते.
प्राचीन मंदिर की भित्ति में सांप एवं नेवले की लड़ाई का अंकन
सांप और नेवले की कहानी महाभारत से लेकर हितोपदेश तक उपलब्ध होती है। बचपन में सांप एवं नेवले की लड़ाई खूब देखी परन्तु वर्तमान में वन्य प्राणी कानून होने के बाद सांप एवं नेवले की लड़ाई दिखाने वाले दिखाई नहीं देते।
![]() |
| नारायणपुर (कसडोल-छत्तीसगढ़) के मंदिर की भित्ति में सांप एवं नेवले की लड़ाई का खूबसूरत अंकन |
नारायणपुर (कसडोल-छत्तीसगढ़) के मंदिर की भित्ति में सांप एवं नेवले की लड़ाई का खूबसूरत अंकन किया गया है। नेवला सांप का परम्परागत शत्रु है, कितना भी बड़ा एवं विषैला सर्प हो, अगर नेवला उसके पीछे पड़ गया तो प्राण लिए बिना छोड़ता नहीं है।
विदेशी वैसे भी भारत को सांपों एवं साधुओं का देश कहते हैं। इनके द्वारा खींचे गए स्नेक चार्मर्स के चित्र बहुधा मिलते हैं। सांपों के प्रति आकर्षण एवं भय दोनो रहता है। विदेशी मंत्र मुग्ध होकर सांपों का खेल देखते हैं।
शिल्पकार ने अपनी छेनी से मंदिर की भित्ति में इसी रोमांच का अंकन किया है।
संसार में दिखाई देने वाली छोटे छोटे को दृश्यों का शिल्पांकन कर शिल्पकार ने अपनी विवेकशीलता का परिचय दिया है। हितोपदेश में नेवले की कई कहानियाँ हैं, जिसमें एक कहानी नेवले के स्वामीभक्ति एवं परोपकार की भी है जो इस प्रकार है………
उज्जयिनी नगरी में माधव नामक ब्रा्ह्मण रहता था। उसकी ब्राह्मणी के एक बालक हुआ। वह उस बालक की रक्षा के लिये ब्राह्मण को बैठा कर नहाने के लिये गई। तब ब्राह्मण के लिए राजा का पावन श्राद्ध करने के लिए बुलावा आया। यह सुन कर ब्राह्मण ने जन्म के दरिद्री होने से सोचा कि "जो मैं शीघ्र न गया तो दूसरा कोई सुन कर श्राद्ध का आमंत्रण ग्रहण कर लेगा।
आदानस्त प्रदानस्त कर्तव्यस्य च कर्मणः।
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम्।।
शीघ्र न किये गये लेन- देन और करने के काम का रस समय पी लेता है।
परंतु बालक का यहाँ रक्षक नहीं है, इसलिये क्या करुँ ? जो भी हो बहुत दिनों से पुत्र से भी अधिक पाले हुए इस नेवले को पुत्र की रक्षा के लिए रख कर जाता हूँ। ब्राह्मण वैसा करके चला गया। वह नेवला बालक के पास आते हुए काले साँप को देखकर, उसे मार कोप से टुकड़े- टुकड़े करके खा गया। वह नेवला ब्राह्मण को आता देख लहु से भरे हुए मुख और पैर किये शीघ्र पास आ कर उसके चरणों पर लोट गया।
फिर उस ब्राह्मण ने उसे वैसा देख कर सोचा कि इसने मेरे बालक को खा लिया है। ऐसा समझ कर नेवले को मार डाला। बाद में ब्राह्मण ने जब बालक के पास आ कर देखा तो बालक आनंद में है और सांप मरा हुआ पड़ा है तो उस उपकारी नेवले को देख कर मन में घबरा कर बड़ा दुखी हुआ।
कामः क्रोधस्तथा मोहो लोभो मानो मदस्तथा।
षड्वर्गमुत्सृजेदेनमर्जिंस्मस्त्यक्ते सुखी नृपः।।
काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार तथा मद इन छः बातों को छोड़ देना चाहिये, और इसके त्याग से ही राजा सुखी होता है।
मखर, याचा उगम मकर अथवा मगरापासून होतो. मगरीच्या (मकराच्या) मुखातून निघालेले तोरण म्हणजे मकरतोरण. याचाच पुढे अपभ्रंश होत जाऊन आजचे मखर तयार झाले. काळानुरूप बदल होत जाऊन हल्ली तोरणाचा उगम मूळ मकरमुख जरी फारसे दिसत नसले तरी नक्षी मात्र अगदी तशीच आहे.
१. वेरूळच्या कैलास लेण्यातील गंगा. बघा ही मकरावर आरूढ असून तिच्या दोन्ही बाजूंच्या स्तंभांवर मकरतोरण आहे.
२. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील महावीराची प्रतिमा. मस्तकी असलेल्या कळसावर मकरतोरण आहे.
३. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरण
४. खिद्रापूरच्याच मंदिराच्या बाह्यभिंतीवरील अजून एक मकरतोरणांकित प्रतिमा
५. सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील स्तंभावरील माहेश्वरी (प्रतिहारी)
६. गोंदेश्वराच्याच स्तंभावरील अजून एक मकरतोरण
७. अंजनेरीच्य विष्णूमंदिरातील वैष्णव प्रतिहार
८. अंजनेरीच्या विष्णूमंदिराच्या बाह्य भागावरील मकरतोरणात असलेला विदारण नरसिंह
९. नारायणपूरच्या नारायणेश्वराच्या राऊळातील शैव प्रतिहार
१०. भुलेश्वर मंदिरातीलल मकरतोरण सभोवती असलेला भैरव प्रतिहारी
११. भुलेश्वरातील मकरतोरणांकित मूषकारूढ विनायकी, नंदीवर आरूढ असलेली माहेश्वरी आणि मयुरारूढ कौमारी
१२. भुलेश्वरातील मकरतोरणांकित प्रेतवाहिनी चामुंडा, गजारूढ ऐन्द्री
१३. सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील अत्यंत देखणे मकरतोरण. मध्यभागी शिवतांडवनृत्य
१४. हे मकरतोरण मात्र सर्वात अर्वाचीन. पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिराच्या दर्शनी भिंतीवर. १८ व्या शतकातील.
मखराची कूळकथा आवडली. तोरणात मकराला स्थान द्यायचं काय विशेष कारण असावं? मकर हे गंगेचं वाहन मानलं गेलं. गजेंन्द्र मोक्षाची कथा मकराशी संबंधित. तसाच "सुंदर ते ध्यान" अभंगात "मकर कुंडले तळपती श्रवणी" असा उल्लेख विठोबाच्या बाबत आहे. यात कुंडलांनाही मकराचा आकार आहे का?
तोरणात मकराला स्थान द्यायचे नक्की कारण माहीत नाही बहुतेक शिल्पात येणारी लयबद्धता हेही कारण असावे किंवा मकर पवित्र मानले जात असावे. बाकी मकर हे गंगेबरोबरच वरूणाचेही वाहन आहे. बाकी विष्णूच्या कानात मकर कुंडले असतात त्यामुळे विठोबाच्याही ती असल्यास त्यात काही नवल नाही.
हा वेरूळ लेणीतील मकरारूढ वरूण
आणि ही दिवेआगरमधली विष्णूच्या कानातील मकरकुंडले (१२ वे शतक)
भुलेश्वरातील तोरणावरील डिझाईन अप्रतिम, सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिरातील तोरण पाहून हे दगडात कोरलेले मानवनिर्मित काम वाटतच नाही.
सध्या
दिसणार्या मंदिरातील सोनेचांदीच्या प्रभावळीतपण मकर आहेच. पण या
तोरणाच्या शीर्षस्थानी असणार्या मुखासंबंधी सांग ना. काही म्हणतात तो
वीरभद्र तर काही महिष.
तोरणाच्या शीर्षस्थानी किर्तीमुख असते. थोडक्यात सिंहमुख.
मंदिरात येऊ पाहणार्या दुष्ट शक्तींना किर्तीमुखे रोखत असतात अशी मूळ धारणा.
अगदी
पूर्वी वास्तु लाकडाच्या असत, त्यातील अवश्यक बाबी (उदा. लाकडी खांबांवर
तुळया टाकताना दिलेले रुंद टेकू, तसेच तुळयांची भिंतींच्या बाहेर निघणारी
टोके इ.) पुढे लेणी खोदताना आवश्यक नसूनही त्या खोदल्या जात. याची उदाहरणे
आहेत का काही तुमच्या फोटोंमधे?..
तशी बरीच उदाहरणे आहेत.
हे पहा वेरूळचे सुतार लेणे. हे चैत्यगृह आहे. पण याची रचना हुबेहूब लाकडी कामासारखी केलीय.
हा पहा अजिंठ्याचा चैत्य. इथे छतावरील लाकडी फासळ्यांची जागा अखंड कोरीव दगडी फासळ्यांनीच घेतलीय.
आणि तुम्ही वर दिलेत तशा शैलीत असणारा देवगिरी किल्ल्यातील हा दगडी सज्जा.
मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय? ड्रॅगनही असाच प्रवेशद्वारावर अथवा घरावर पहारा देत दुष्ट शक्तींना पिटाळून लावतो असे तिकडे समजतात.
मकर आणि नाग (आणि काही ठिकाणी सिंहसुद्धा) अतिपूर्वेला जाता जाता त्यांचा काल्पनिक संकर होऊन ड्रॅगन बनला असावा काय?
त्याबद्दल नक्की काही सांगता येत नाही. पण जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींमध्ये काही ना काही गोष्टी समान आहेत. ड्रॅगनचे मूळ कितपत जुने ते काही माहित नाही.
पण हा अजिंठा लेणीतील १७ च्या क्रमांकाच्या विहारातील हे चित्र रोचक ठरावे.
जगातील पहिले व्यंगचित्र ( शिल्प ) - महेन्द्र शेगावकर
जगातील पहिले व्यंग चित्र (शिल्प)
भरहूतच्या स्तुप स्तंभावरचेच.....
कारण हे शिल्प इ.स.पु. दुसऱ्या शतकात साकारल्या गेले !
दंतवैद्याकडे पाळलेले माकड असते . वैद्यबुआ एका व्यापाऱ्याचा दुखरा दांत उपटून त्याला वेदनामुक्त करतात , त्याचा मोबदला म्हणून व्यापारी सुकामेवा , फळे , खजूर व द्रव्यही देतो .
माकडाने हे बघितले ,. त्याने ठरविले ,की आपणही वैद्य झालोच पाहिजे .
त्याने त्याचा व्यवसाय सूरु केला ......
एक व्यापारी आपला दांत उपटून घेत आहे . भल्लीमोठी सांडसी लावलेली आहे . तीला दोर बांधून हत्ती ओढत आहे . हत्तीला उत्साह यावा म्हणून काही माकडे ढोल, पिपाणी, ताशे वाजवत आहेत ....
एक माकड तर चक्क हत्तीच्या शेपटीचा कडाडून चावाच घेत आहे ...
दुखरा दांत व माकडचाळे पाहून त्राग्याचे भाव व्यापाऱ्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत ...
आज हे शिल्प कलकत्ता वस्तुसंग्राहलयात आहे .
बौध्द जातककथामध्ये काही विनोदी जातककथाही आहेत .त्यातील ही एक विनोदी जातककथा आहे ,.
" आधा अधूरा हकीम , मरिज के लिए जान का खतरा ! "
मूती मालिका -५
भक्ताची भव्य मूर्ती (औंढा नागनाथ, जि.हिंगोली)
देवदेवतांच्या कलात्मक आणि भव्य मूर्ती आपण पाहतो पण सामान्य भक्ताची मूर्ती आणि तिही इतकी भव्य? हे आश्चर्य औंढा नागनाथ येथील मंदिरावर आढळून येतं. मूर्तीची भव्यता लक्षात यावी म्हणून मी हा पाठभिंतीचा पूर्णच फोटो मुद्दाम दिला आहे. दोन्ही हात जोडलेले, पद्मासनात बसलेली, चेहर्यावर शांत भाव असलेली, कुठलेच अलंकरण नसलेली ही मानवी मूर्ती लक्ष वेधून घेते. औंढ्याचं मंदिर पश्चिमाभिमुख आहे. त्याबद्दल सांगताना संत नामदेवांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही, मग त्यांनी आपल्या भक्तीच्या शक्तीने देवालाच बदलण्यास भाग पाडले, आणि मंदिर फिरून पश्चिमेला आले. यातला खरेखोटेपणा माहित नाही कारण ही दंतकथा आहे. पण पूर्वेला एका भक्ताची भव्य मूर्ती मंदिरावर कोरून भक्तीची महती किती याचा पुरावाच इथे आढळतो.
गर्भगृहाच्या पाठभिंतीवर ही मूर्ती पूर्वेला तोंड करून विराजमान आहे. अशाच अजून दोन मूर्ती दक्षिण आणि उत्तरेला गाभार्याच्या बाह्यांगावर आहेत. दीड मिटर बाय दीड मिटर इतक्या भव्य कोनाड्यात या मूर्ती आहेत. मुर्तीच्या बाजूला छत्रचामर धारिणी आहेत. मुर्तीच्या माथ्यावर साधी टोपी आहे. त्यावर चंद्रासारखी आकृती कोरलेली आहे.
मंदिराला प्रदक्षिणा घालून आपण मागे या मूर्तीच्या समोर दगडी पायर्यांवर बसूलो तर एक वेगळाच अनुभव येतो. भक्तीतून येणारी शांत समाधानाची भावना मनात जागी येते. आपण मूर्तीसमोर हात जोडतो पण इथे मूर्तीच आपल्या समोर हात जोडते आहे, आपल्यातले पावित्र्य देवत्व जागवते आहे असे काही विलक्षण जाणवते. देवदर्शन करून घाईघाईत निघून जाणार्या अंधभक्तांचे काही सांगता येत नाही पण खरा भक्त, रसिक, शिल्पप्रेमी या मूर्तीच्या प्रेमात पडून समोरच्या दगडी पायर्यांवर बसून राहतो हे निश्चित.
तज्ज्ञांनी यावर अजूनही सविस्तर कुठे काही लिहीलं नाही (three huge sculptures probably of devotee इतकाच उल्लेख गो.ब. देगलुरकरांच्या पुस्तकात आहे). या प्राचीन भव्य मंदिरावर सर्वात मोठ्या आकारात या मानवी मूर्ती कशासाठी कोरल्या गेल्या आहेत? का हा कुणा देवतेचाच प्रकार आहे? कुणाला याची माहिती असल्यास खुलासा करावा.
चक्रव्युह छेदणारा अभिमन्यु (होयसळेश्वर. हळेबीडू)
कर्नाटकातील होयसळेश्वर मंदिर शिल्पकलेचा अत्युच्च नमुना आहे. या मंदिरावर बाह्य भागात एक फुट उंच आणि दोन अडीच फुट रूंद असा हा सुंदर शिल्पपट आहे. महाभारतात ज्याचे वर्णन आलेले आहे तो चक्रव्युह या ठिकाणी कोरलेला आहे. रथावर अर्जूनपुत्र अभिमन्यु स्वार आहे. सहस्त्रावधी बाणांनी तो लढतो आहे. त्याला कर्णाने पूर्णत: घेरले आहे. त्याचे बाण आपल्या बाणांनी रोकले आहेत. डाव्या बाजूला भीम आणि हिडिंबेचा पुत्र घटोत्कच दाखवला आहे. त्याच्या हातात गदा आहे. इतक्या छोट्या शिल्पात राक्षस कुळातील घटोत्कच वेगळा दाखवत शिल्पकाराने कमाल केली आहे.
खरी कमाल तर चक्रव्युहात बारीक बारीक कोरलेल्या सैन्याला दाखवून केली आहे. हा फोटो मी साध्या मोबाईलच्या कॅमेर्यातून काढलाय. मोठ्या कॅमेर्यातून फोटो काढून enlarge करून बघितल्यास बारकावे अजून नीट समजतील.
होयसळ शैलीत शिल्पकलेने कळस गाठला होता असं म्हणतात ते उगीच नाही. हळेबीडू आणि बेलूरच्या मंदिरात त्याचा प्रत्यय दर्शकांना जरूर येतो. ही मंदिरे आपल्या एखाद्या मोठ्या सहलीचा भाग म्हणून गडबडीत पाहू नका. किमान एक संपूर्ण दिवस इथे घालवला पाहिजे. तर इथलं शिल्प सौंदर्य समजू शकेल. बारकावे पहायचे तर आठवडा लागतो.
मूर्ती मालिका -९
नर्तकाची देखणी मूर्ती
अजिंठ्याच्या जवळ अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथे उत्तर चालूक्य कालीन मंदिर आहे. या मंदिवरील विष्णु शक्तीच्या मूर्तींमुळे अभ्यासकांचे लक्ष इकडे वेधले गेले. याच मंदिरावर प्रदक्षिणा पथावर उजव्या बाजूला ही नर्तकाची मूर्ती मला आढळून आली. या पूर्वी तीन चार वेळा मंदिर बघितले पण ही मूर्ती लक्षात आली नव्हती. नर्तकी, अप्सरा, सुरसुंदरी या नावाने ओळखल्या जाणार्या स्त्री शिल्पांची माहिती होती. अशी भरपुरं शिल्प मंदिराच्या बाह्य भागावर आढळून येतात. पण या तूलनेत मोठ्या आकारातील (शिल्पाची उंची दीड फुट) नृत्य पुरूष (नर्तक) शिल्पांची संख्या फारच कमी आहे.
या नर्तकाचे कानातले, गळ्यातले, दंडावरचे ठळक ढोबळ वाटणारे दागिने वेगळेपण सांगतात. स्त्रीयांचे दागिने नाजूक कोरलेले असतात. कमरेला असलेली मेखला जाड माळेसारखी दाखवलेली आहे. स्त्रीयांच्या मेखलेचा नाजूकपणा इथे नाही. नर्तकी-नर्तकांचे डोळे काजळाने अधोरेखीत केले असल्याने ठसठशीत दिसून येतात. या नर्तकाचे डोळे तसेच आहेत. ओडीसी नृत्यात यासारखी मुद्रा असलेले गुरू केलूचरण महापात्रा यांचे छायाचित्र प्रसिद्ध आहे. कथ्थक मध्येही याला साधर्म्य साधणारी मुद्रा आढळते. लेणी आणि मंदिरांवर आढळून येणार्या नृत्यमुद्रांवरूनच नंतरच्या काळातील नृत्य प्रकार समृद्ध होत गेले असं अभ्यासक सांगतात.
या मंदिर सभामंडपात भव्य अशी वर्तुळाकार रंगशीळा आहे. भोवती आसन कक्ष आहेत. म्हणजे देवतेच्या समोर नृत्य सादर केले जायचे व ते पाहण्यासाठी लोक आसनांवर बसून असायचे. मंदिरांचा मुख्य मंडप हा कलाविष्काराचे केंद्र होता.
तूमच्याकडे अशा शिल्पांवर अभ्यास झालेला असेल तर जरूर माहिती सांगा.ना..
प्राचीन मंदिरांवर विविध शिल्पे आढळून येतात ती केवळ सहज म्हणून कोरलेली नसतात. त्यांची एक परिभाषा असते. ते शिल्प तिथेच का कोरले याचे विशिष्ट कारण असते. छायाचित्रातले हे जे शिल्प आहे ते द्वारपालाचे आहे. मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करतानाच्या दरवाज्याची जी चौकट असते त्यावर अतिशय कलात्म नक्षीकाम असते. त्याला द्वारशाखा म्हणतात. या द्वारशाखा एक दोन तीन अगदी माणकेश्वर मंदिर (ता. भुम जि. उस्मानाबाद) इथे तर तब्बल सात द्वारशाखा आहेत. या द्वारशाखेच्या तळाशी द्वारपालाचे शिल्प कोरलेले असते. हे शिल्प होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिराच्या द्वारशाखेवरील द्वारपालाचे आहे.
या द्वारपालाच्या हातात डमरू आणि त्रिशुळ आहे. यावरून हा शैव द्वारपाल असल्याचे अनुमान काढता येते. म्हणजे हे मंदिर शैव देवतेचे आहे हे ठरवता येते.
आक्रमकांच्या भितीने बहूतांश मंदिराच्या गर्भगृहातील मूर्ती भक्तांनी मुळ जागेवरून दूसरीकडे नेवून ठेवल्या. मग बराच काळ लोटल्यावर सगळं काही स्थिरस्थावर झाल्यावर रिकामा गाभारा पाहून स्थानिक भाविकांनी घडवायला सोपी म्हणून महादेवाची पिंड आणून बसवली. मग मंदिर मुळ कुठल्या देवतेचे? हे ओळखणं अवघड होवून बसले. अभ्यासकांनी हे दाखवून दिले की जी मुख्य देवता मूर्ती आहे त्या अनुषंगाने द्वारपाल, ललाटबिंबावरील देवता, बाह्य भागातील देककोष्टकांतील देवता यावरून काही अनुमान काढता येते.
गर्भगृहातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी जी प्रणाल असते तिलाही अर्थ आहे. तिथे गोमुख कोरले आहे किंवा मकर प्रणाल आहे याचेही अर्थ आहेत.
अतिशय देखणी अशी ही शैवद्वारपालाची मूर्ती आहे. आजूबाजूला इतर भक्तगणांची शिल्पे आहेत. सर्वच नृत्याच्या ललित मूद्रेत आहेत. भोवती सुरेख नक्षी आणि किर्तीमुखही कोरलेले आहे.
मंदिराचा मुख्यमंडप आणि गाभारा यांना जोडणार्या जागेला अंतराळ असा शब्द आहे. या ठिकाणी अंधारच असल्याने इथली शिल्पकला दूर्लक्षीत राहते. प्राचीन मंदिरात गेलात तर गर्भगृहाच्या द्वारशाखा आवर्जून बारकाईने न्याहाळा. खुप सुंदर कलाकृती इथे दिसतील.
र सौजन्य
मंदिरांवर कोरलेल्या शिल्पांमागे काही एक अर्थ दडलेला असतो. पण काही शिल्प काही वास्तुरचना या सौंदर्याचा भाग बनुन निखळ कलात्मक आविष्कार बनुन येतात. पशु पक्षांच्या या सहा जोड्या घोटण (ता. शेवगाव जि. नगर) थेथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावरील आहेत. मंदिराच्या पायाशी गजथर, अश्वथर असतो. पण हे प्राणी युद्धात वापरले जाणारे आहेत. मोर हंस गरुड हे देवतांचे वाहन आहैत. पण घोटण मंदिरावरील ही शिल्पे मुख्य मंडपावरील खांबांवर स्वतंत्र शिल्प म्हणून कोरलेली आहेत हे विशेष. बदक, हत्ती, हंस, वराह, हरिण आणि वानर अशा या सहा जोड्या आहेत. यातही परत नर मादी असं काही दाखवलं असतं तर त्यालाही काही वेगळा अर्थ देता आला असता. इथे तसंही नाही. केवळ जोड्या आहेत. मुख्य मंडपाच्या स्तंभांवर पौराणीक संदर्भ कोरलेले असतात किंवा नक्षी असते. पण इथे प्रामुख्याने पशु पक्ष्यांच्या जोड्या आहेत.
तेराव्या शतकातील या मंदिराचा जिर्णोद्धार पेशवेकाळात १८ व्या शतकात करण्यात आला. पुरातत्व खात्याकडून हे मंदिर चांगल्या पद्धतीनं जतन केलं गेलं आहे. पैठणपासून दक्षिणेला २० किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथपर्यंत जाण्यासाठी रस्ता चांगला आहे.
गुढ शिल्पे (गोकुळेश्वर, चारठाणा)
काही मंदिरांवर तंत्रमार्गी, अघोरपंथी, शाक्तपंथी अशी शिल्पे कोरलेली आढळून येतात. त्यांचा अर्थ त्या संप्रदायातील एखाद्या कृतीशी निगडीत असतो. पण सामान्य दर्शकाला मात्र कळत नाही.
हे शिल्प चारठाणा (ता. जिंतूर जि. परभणी) येथील गोकूळेश्वर मंदिराच्या मुखमंडपाच्या स्तंभावरील आहे. यात एकुण पाच मानवी आकृती दिसून येतात. पण पाय मात्र ८ आहेत. दोन्ही टोकाच्या दोन स्त्रीया आहेत. अगदी मधला पुरूष आहे. पण त्या बाजूचे दोन कोण हे चटकन कळत नाहीत. कारण त्यांचे केस स्त्रीयांसारखे मागे बांधलेले आहेत. पण छाती सपाट दाखवली असल्याने त्यांना स्त्री संबोधता येत नाही.
मधल्यांनी बाजूच्यांच्या डोक्यावर हात ठेवले आहेत. शिवाय सर्वात मधल्याचे वाटणारे दोन्ही हात बाजूच्या स्त्रीयांच्या हातात आहेत. हेच हात मधल्या पुरूषांचेही भासतात. पायासोबतच हाताचीही संख्या आठच आहे.
यातील टोकाच्या स्त्रीया स्वतंत्र आहेत. मधले तीनही एकमेकात अडकलेले आहेत. एक तर्क असा मांडता येतो. पुरूषाच्या उजव्या बाजूस त्याची शक्ती असते आणि डाव्या बाजूस पत्नी (वामांगी). बहूतेक देवतांच्या बाबत हे शिल्पांकित केलेले आढळून येते. येथे सामान्य पुरूषाच्या बाबतीतही हे सुचित केले असावे. आणि आज कार्टून काढताना जशी चलचित्र (animation) काढली जातात तसे उजवीकडचे चित्र पहिले, दूसरे चित्र दोन्ही स्त्रीयांचे हात हाती घेतलेले. आणि तिसरे मग पूर्णत: डावीकडच्या स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवला असे. मधला पुरूष एकच असावा. फक्त तीन अवस्थांत दाखवला आहे. याला एक गती आहे. ही नृत्यातीलही एक गतीमान अशी मुद्रा असू शकते. कारण डाव्या बाजूच्या स्त्रीच्या हातात टिपरी सारखे काही दिसत आहे.
याचा तंत्रमार्गातही काही वेगळा अर्थ असू शकेल. केसांची आणि पायांची रचना यातून पुरूषांत स्त्रीचा अंश आहे असेही सुचवायचे असावे.
तूमच्या सारख्या अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. Dr-Arvind Sontakke हे तूम्हा अभ्यासकांना आव्हान ठरणारे विषय आहेत.होट्टल (ता. देगलुर जि. नांदेड) येथील मंदिरांचा विविध पैलूंनी बारीक विचार झाला पाहिजे. आता हे जे शिल्प आहे ते गर्भगृहाच्या द्वारशाखेवरील तोरणाचे आहे. समोरून पाहताना हातात माळा घेतलेले यश किन्नर दिसतात. त्यांच्या हातातील माळांची सुरेख अशी नक्षी बनलेली आढळून येते. या भागात सहसा अंधार असतो त्यामुळे संपूर्ण शिल्पाकडे लक्ष जात नाही. पण या तोरणावर प्रकाश टाकला आणि खालची बाजू बघितली तर आपण चकित होतो. हे शिल्प 3D आहे. आपल्याला दिसते ती छाती पासून वरची बाजू दर्शनी प्रतलात आहे. पण कमरेपासून खालची बाजू दूसर्या प्रतलात आहे. ९० अंशाचा कोन करून या मानवी आकृत्या वळवलेल्या आहेत. शिल्पकलेतील हे मोठं आव्हानात्मक काम आहे. अशाच पद्धतीने द्वारशाखेवर नृत्य करणारे स्त्री पुरूष दाखवलेले आहेत. म्हणजे शिल्पकलेत एकाच प्रतलाचा वापर न करता दोन दिशा दोन प्रतलात शिल्प कोरलेली आढळून येतात. हे केवळ सौंदर्यपूर्णच आहे असे नाही तर गणिताचा अभ्यास करून निर्माण झालं आहे.
प्राचीन मंदिरांबाबत अशा काही बाबी खरंच आचंबीत करतात. वास्तुशास्त्र, शिल्प सौंदर्य, विज्ञान, गणित असा अद्भुत संगम इथे पहायला मिळतो. दगडाची प्रतवारी शोधून मगच शिल्प कोरले जाते. दगडी चिर्यांची रचना नुसती सौंदर्यपूर्ण नसते तर त्यात शास्त्रही सांभाळलेले असते.
अशा अवघड जागी वर चढून फोटो काढल्या बद्दल धन्यवाद मित्रा.घोटण (ता. शेवगांव, जि. नगर) येथील मल्लिकार्जूनेश्वर मंदिरावर पशु पक्षांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पं असल्याचे याच मालिकेत पूर्वी लिहिलं होतं. याच मदिराच्या स्तंभांवर युद्ध आणि युद्ध सराव अशी काही शिल्पे आढळून आली. ही शिल्पे पण वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पहिल्या शिल्पात तलवार घेवून लढणारे दोन योद्धे दिसत आहेत. त्यांनी शिरस्त्राण घातलेले आहेत. प्रत्यक्ष युद्धापेक्षा हा युद्ध सराव असावा. दूसरे शिल्प कुस्तीचे आहे. खेळा सोबतच युद्धाची तयारी म्हणून प्रशिक्षणाचा भाग असावा.
तिसर्या शिल्पात हत्ती आणि घोडा आहे. हत्तीने सोंडेत एक माणूस पकडला आहे. समोरचा घोडा उधळलेला आहे. हत्तीवर माहूत नाही. प्रत्यक्ष युद्धातीलच एक क्षण शिल्पात फोटोसारखा पकडला आहे. चौथे आणि शेवटचे शिल्पही असेच गतीमान आहेत. यात दोन अश्वस्वार दिसत आहेत. दोघांच्याही हातात भाले दिसत आहेत. दोघांच्या मध्ये जमिनीवर एक योद्धा आहे. घोडे मागील दोन पायांवर आहेत. युद्धाचा जोर इथे दिसून येतो. वीररसात ही शिल्पे न्हावून निघाली आहेत.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद, 9422878575
मूर्ती मालिका -२१
लाकुड नव्हे हा दगड आहे
वेरूळ लेण्यातील ३२ क्रमांकाच्या लेणीत स्तंभावरील हे नक्षीकाम नजरेस पडले आणि पाय अक्षरश: थिजलेच. पर्णयुक्त घटाचे शिल्प खुप ठिकाणी पहायला मिळते. त्यावर उत्तम नक्षीकामही केलेले असते. पूर्ण कलशास स्त्री गर्भाचे प्रतिक मानले जाते. हे मंगल प्रतिक आहे. पूर्ण कलश म्हणजेच पाण्याने भरलेला, त्यावर पर्ण आणि या कलशास हार, रत्नांच्या माळांनी शृंगारलेले असते.
वेरूळच्या या स्तंभावर प्राचीन मांगल्य संकल्पना प्रमाणे शिल्पांकन आहेच. पण मुख्य म्हणजे शिल्पकाराने कलाविष्कारासाठी स्वातंत्र्य घेत ज्या अप्रतिम पद्धतीने बारकावे कोरले आहेत ते थक्क करणारे आहेत. कलशाच्या मुखातून खाली लोंबलेली पाने आणि त्यांना समतोल करण्यासाठी सोन्याचा मोत्याचा गोफ अशा माळा बघत रहाव्यात अशा आहेत.
कलशावर पण नक्षी कोरलेली आहे. हे सगळं एका अखंड स्तंभाचा भाग आहे. सगळं दालनच एका दगडात कोरलेलं. चुकीला जागाच नाही. मंदिराच्या उभारणीत तरी एखादा दगड शिल्पकामात डावा वाटला तर बाजूला काढता येतो. लेणीत म्हणजेच लयन स्थापत्यात चुकीला जागाच नाही. हे लक्षात घेतलं म्हणजे या कामाचे मोल कळते. कलशाच्या चारही बाजूला खाली यक्ष किन्नरही कोरलेले आहेत. वेरूळचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यता. पण कुठेही बोजडपणा नाही. कवेत येणार नाहीत असे रूंद आणि उंच खांबही विलक्षण सुंदर आहेत. कलात्मक दृष्ट्या नाजूक कलाकुसरीने मढलेले आहेत.
या लेण्यांच्या शिल्पकलेने वेडे होवून परत परत भेट देणार्यांची संख्या प्रचंड आहे. वेरूळ अजिंठ्याचा नाद लागला की माणूस "आषाढी कार्तिकी" वार्या करत राहतो.
हा आमचा वेडावलेला फ्रेंच मित्र वर्षातून किमान एकदा तरी वेरूळची वारी करतोच. काही परदेशी पर्यटक तर तिथेच मुक्काम ठोकुन असतात. भारतीय भावा बहिणींना हात जोडून विनंती तूम्ही कैलास लेण्याशिवाय बाकीच्या सुंदर लेण्यांना किमान एकदा भेट द्या. शांतपणे लेण्या बघा. कुठून कुठे जाताना रस्त्यात वेरूळ लागलं म्हणून वचावचा पाहून पळून जावू नका.)
कैलास लेणं (वेरूळ, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) विविध कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ट्य आहे भव्यता. ही भव्यता कलात्मक आहे. केवळ प्रचंड मोठी एखादी ओबडधोबड वास्तु आहे असे नव्हे.
कैलास लेण्यातील दर्शनी भागातील हे दोन द्वारपाल. सामान्य मानवी आकारापेक्षा जरा मोठेच आहेत. हातातील गदा जमिनीवर रोवून द्वारपाल अतिशय रिलॅक्स असे उभे आहेत. त्यावर त्यांची ढोपरं विसावली आहेत. त्यांच्या गळ्यातले दागिने, पायातले तोडे, कमरेची मेखला संपन्नता दर्शवतात. या भव्य मंदिरात प्रवेशणार्या भक्तांकडे ते कौतूकाने पहात आहेत.
राष्ट्रकुटांची सत्ता या काळात शिखरावर होती. त्यामुळे संपन्नता भव्यता शांतपणा असा भाव आपल्याला इथे पहायला मिळतो. ज्या ८ व्या शतकात लेणं कोरल्या गेलं त्या काळाचाही विचार केला पाहिजे.
कैलास लेण्याचा विचार असा विविध पैलूंनी करता येतो. प्रत्येकवेळी भेट दिली की काहीतरी वेगळंच लक्षात येतं. सौंदर्याची प्रचिती प्रत्येकवेळी नव्याने येते.
म.
द्वारशाखेवरील 3D शिल्प
होट्टल मंदिरातील गर्भगृहाच्या तोरणावरील 3D शिल्पाचा उल्लेख यापूर्वी या मालिकेत आला आहे. हे आताचे शिल्प आहे अन्वा (ता. भोकरदन जि. जालना) येथील महादेव मंदिराच्या द्वारशाखेचे. अतिशय आकर्षक अशी ही द्वारशाखा. एकुण पाच द्वारशाखा या मंदिराला आहेत. शार्दूल शाखा, पुष्प शाखा, स्तंभ शाखा, पुष्प शाखा अशा क्रमाने चार शाखा आहेत आणि पाचवी छायाचित्रात दिसणारी विद्याहार शाखा. गायन वादन नृत्य करणारे स्त्री पुरूष यावर कोरलेले आहेत. यात मध्यभागी पुरूष आहेत आणि आजू बाजूला छोट्या आकारात स्त्रीया आहेत.
कोपर्याचा वापर करून त्यावर अशी नक्षी कोरायची हे आवाहन शिल्पकाराने लिलया पेलले आहे. आश्चर्य म्हणजे यातील प्रत्येक शिल्प वेगळे आहे. एकच आकृती परत परत डिझाईनचा भाग म्हणून काढलेली नाही. प्रत्येक शिल्पाचा वेगळा विचार केला आहे हे विशेष. या द्वारशाखांवर एका बाजूला विष्णु आणि एका बाजूला लक्ष्मी कोरलेली आहे. आपण ज्याला एकसारखे बारीक डिझाईन समजतो ते एकसारखे नसते. जवळून बारकाईने निरिक्षण केल्यास त्यातील फरक लक्षात येतात आणि थक्क व्हायला होतंं. एका पुष्पशाखेत कळी पासून अर्ध उमलले, पुर्ण उमललेले, कोमेजलेले अशा सर्व अवस्था दाखवलेल्या आहेत. एक एक मंदिर पहायचे तर किमान एक दिवस तरी पूर्ण घालवला पाहिजे. ज्या अनाम शिल्पकारांनी आयुष्य खर्च करून हे निर्माण केलं त्यांच्यासाठी किमान दिवस तर खर्च करून कलेला दाद द्यावी.
वालूर (ता. सेलु, जि. परभणी) हे अतिशय प्राचीन वारश्याने संपन्न असे गाव.
या मित्राने याच गावावर लिहिलं आहे. या गावातील सिद्धेश्वर मंदिरावरील हे द्वारपाल. वेरूळच्या कैलास लेण्यांतील द्वारपालांवर नुकतंच लिहिलं होतं. त्याच्या साधारण ५०० वर्षानंतरचा या मंदिराचा कालखंड असावा. द्वारपालांचे मुकुट, पाठीमागची प्रभावळ, अलंकरण यादवांच्या काळातील समृद्धी दर्शवते. उत्तर यादवांच्या काळातील मंदिरं आणि बारवा या परिसरांत प्रामुख्याने आढळतात. सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकुट, चालूक्य आणि यादव या राजघराण्यांची समृद्धी या भागातील प्राचीन वारशावरून स्पष्ट होते.या दोन्ही द्वारपालांचे दरवाजाच्या दिशेचे पायाचे पंजे आत वळलेले आहेत आणि विरूद्ध दिशेचे सरळ समोर आहेत. म्हणजे आतून काही आज्ञा आली की आत वळायचेच आहे. या शिल्पांत उभं राहण्याची ललित मूद्रा मोहक आहे. मंदिराचा जो भाग शिल्लक आहे त्यावर फारसे शिल्पांकन नाही. इथेच एक मैथून शिल्पाची शिळा निखळून पडली आहे. त्यावरून आणि या द्वारपालांवरून कोसळलेल्या भागात काही शिल्पे असावीत याचा अंदाज येतो.
या मंदिराच्या प्रदक्षिणा पथावर वाळवणं घातली आहेत. भिंतींना खिळे ठोकून दोर्यांवर कपडे वाळत घातले आहेत. मंदिराच्या बाजूने गटार वहाते आहे. मंदिराच्या भिंतीला लागुन चुली मांडल्या आहेत पाणी तापविण्यासाठी. त्याची काजळी भिंतींवर चढत आहे. मंदिराच्या छतावर गवत वाढले आहे. काय अनास्था आहे कळत नाही. अशा उकिरड्यात हे शिल्पसौंदर्य पडलेलं आहे.
गोकुळेश्वर मंदिर चारठाणा (ता. जिंतुर जि. परभणी) येथील मंदिराच्या खांबावर हे शिल्प आहे. या पूर्वीही खांबावरील गुढ शिल्पावर लिहिले होते. या शिल्पात चार व्यक्ती दिसत आहेत. घोड्याच्या पुढे आणि मागे शस्त्रधारी सैनिक दिसत आहेत. त्यांच्या हातात तलवार, खड्ग किंवा दंडा असे काहीतरी दिसत आहे. एक सैनिक घोड्यावर बसलेला आहे. जो आरोपी आहे तो वाकलेला असून त्याची मान खाली झुकलेली आहे.
हत्तीच्या पायी तुडवणे अशी एक मृत्युदंडाची शिक्षा असते. तसेच गाढवावरून धिंड अशीही एक शिक्षा आहे. इथे घोडा आहे. घोड्याच्या पायी तुडवणे अशीही शिक्षा असावी.
काही शिल्पे ही केवळ शिल्पे नसतात. त्यामागे धार्मिकते पलिकडचा त्या काळातील समाज जीवनाशी संबंधीत काही संकल्पनांचा गुढ अर्थ असतो. याचा वेगळा विचार झाला पाहिजे.
शिल्पांचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी मंदिराचे निरिक्षण करण्यात वेळ खर्च करावा लागतो. परत परत त्या मंदिराला भेट द्यावी लागते.
ml

>> आशुतोष बापट
ग्रीक
पुराणकथांमधील पंखधारी घोडा अर्थात पेगॅससबद्दल काही कथा आपण बघितल्या.
याच पंखधारी घोडय़ाबद्दल अजून एक बाब म्हणजे कॉरिन्थच्या नाण्यांवर पंख
असलेल्या पेगॅससचा छाप दिसून येतो. इ.स.पूर्व 4 थ्या शतकातील कॉरिन्थच्या
चांदीच्या नाण्यावर पंखधारी पेगॅसस कोरलेला आहे. त्याच कालखंडात निर्माण
झालेल्या लाम्पसॅकसच्या नाण्यांच्या मागच्या बाजूवरसुद्धा पंखधारी अश्वाचे
शिल्प बघायला मिळते. म्हणजेच कलेमध्ये या पंखधारी घोडय़ाचे स्थान जसे
शिल्पांमध्ये आहे तसेच ते नाण्यांवरसुद्धा दिसून येते. पंखधारी घोडय़ासारखा
अजून एक चमत्कारिक प्राणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पंखधारी हत्ती.
अमरावती,
सांची, नागार्जुनकोंडा इथल्या उडणाऱया हत्तींची शिल्पे बुद्धजन्माच्या
चमत्काराची घटना दाखवतात. या शिल्पांमधे जरी हत्तींना पंख दाखवले नसले
तरीसुद्धा त्यांच्या शिल्पांवरून ते आकाशात विहार करताहेत हे स्पष्टपणे
समजून येते. अर्थात हत्तींना पंख दाखवणे हे काही हिंदुस्थानी कलाकारांना
अगम्य नव्हते. अमरावती इथल्या शिल्पांमधून आपल्याला पंख असलेले हत्ती
शिल्पांकित केलेले बघायला मिळतात.
हिंदुस्थानी
पौराणिक कथांमधील इंद्राचा ऐरावत हा हत्ती आणि बौद्ध धर्मातला ऐरावत हे
दोन्हीही हत्ती खूप उंच, अगदी स्वर्गापर्यंत भरारी घेतात असेच समजलेले आहे.
याच ऐरावताच्या रूपावरून प्राचीन हिंदुस्थानी कलाकारांना हत्तींना पंख
दाखवण्याची कल्पना सुचली असावी. पावर्ती सम्राटाची सात लक्षणे म्हणून जी
रत्ने दाखवतात, त्यापैकी हत्ती हे एक रत्न आहे. ज्याला ‘उपोसतन श्रेणीचे’
रत्न समजले जाते. कलिंगबोधी जातकामधील राजपुत्र हत्तीवर बसून आकाशात फिरून
येतो अशी कथा येते, तर वेस्संतर जातकानुसार पाऊस पाडणारा हत्ती हा एक
स्वर्गीय हत्ती दाखवला असून तो उडू शकतो असे उल्लेख येतात. उडणे ही ािढया
पक्ष्यांशी संबंधित असल्यामुळे शिल्पांमध्ये जमिनीवरील प्राण्याच्या
शरीराला पक्ष्याचे पंख जोडलेले दाखवून तो एक उडणारा प्राणी म्हणून दाखवला
जातो. हत्ती, हत्तीशास्त्र यावर ग्रंथनिर्मितीसुद्धा झालेली आहे. त्यातलाच
एक ‘मातंगलीला‘ हा हत्तीशास्त्रावरील महत्त्वाचा ग्रंथ. या ग्रंथात हत्ती
आणि त्यांना असलेल्या पंखांची चित्रे काढलेली आहेत. तंजावर इथल्या सरस्वती
महाल ग्रंथालयात हा ग्रंथ बघायला मिळतो.
पंखधारी हत्तींनंतर
एक महत्त्वाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे किन्नर आणि किन्नरी
हा होय. त्यांच्याबद्दल खूप रंजक अशा कथा प्रसिद्ध आहेत.
किन्नर आणि किन्नरी
किं-नर?
म्हणजे हे नर आहेत का ? किन्नर या नावातच हा प्रश्न विचारला आहे.
माणसासारखे दिसणारे, पण मनुष्यप्राणी नाहीत असे हे जीव आहेत. अर्धा माणूस,
अर्धा घोडा आणि पक्षी असे स्वरूप असणारे हे किन्नर. हे किन्नर यक्ष, गंधर्व
या श्रेणीत मोडतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेमध्ये किन्नरांचे आकर्षक
शिल्पांकन केले आहे. तिथे त्यांचे दर्शन अनेकदा होते. सांची, भारहूत,
अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा इथल्या शिल्पांमधून आपल्याला बऱयाच ठिकाणी
किन्नर शिल्पे दिसून येतात. अजिंठा चित्रकलेतही किन्नरांचे चित्रांकन
केलेले आहे. बऱयाचदा हे किन्नर, स्तूपाच्या भोवती कोरलेले दिसतात. इथे ते
स्तूपाची पूजा करताना दाखवलेले असतात. हातात फुलांचा हार किंवा हातात तबक
आणि त्या तबकात फुले घेऊन ते स्तूपाच्या पूजेला जाताना दाखवतात. ते
बोधीवृक्ष, धर्मपा यांच्या समवेत दिसतात, तर काही ठिकाणी ते हातात
तंतुवाद्य घेतलेले दिसतात. प्राचीन हिंदुस्थानी कलेत किन्नरांचे शिल्पांकन
विपुल प्रमाणात बघायला मिळते.
किन्नरींची शिल्पे ही किन्नरांच्या इतकी
विपुलतेने दिसत नाहीत. किन्नरी ही सर्वसाधारणपणे किन्नरासोबतच दाखवलेली
असते. अजिंठय़ाच्या चित्रकलेत किन्नर-किन्नरींची चित्रे फार सुरेख चितारलेली
आहेत. अजिंठय़ाच्या भित्तीचित्रात हातात झांजा घेतलेल्या किन्नरीचे चित्र
फारच लक्षवेधक आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणात किन्नराचे वर्णन अर्धा माणूस
आणि अर्धा घोडा असे आलेले आहे, परंतु बौद्ध धर्मीयांच्या समजुतीनुसार
किन्नर म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पक्षी होय. बोधगयेला एका यक्षाचे
शिल्प आहे. तिथे त्या यक्षाचे डोके घोडय़ाचे आहे. वस्तुत ही एक किन्नरी असून
जातकातील चित्रकथेनुसार तिला गंधर्व मानले गेले आहे. जातकातील नोंदीनुसार
किन्नर हे परी वर्गातले असून ते नेहमी जोडीने जाताना दाखवतात. त्यातून
त्यांचे एकमेकांप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवली जाते. चंद किन्नर जातकात
अशाच एकनिष्ठ प्रेमाचा दाखला दिलेला आहे. किन्नर हे दीर्घायुष्यासाठीदेखील
प्रसिद्ध आहेत. जातकांमधून किन्नरांचे वर्णन करताना त्यांना निष्पाप आणि
निरुपद्रवी दाखवतात. ते निरागसपणे पक्ष्यांसारखे उडय़ा मारतात, संगीत आणि
गाण्याचे त्यांना वेड असते. किन्नरी झांजा वाजवते तर किन्नर बासरी वाजवतात.
जातक 481 मध्ये या निरागस जिवांबद्दल अजून एक वर्णन आले आहे. त्यानुसार
किन्नरांना पकडले जाते आणि पिंजऱयात बंदिस्त करून नजराणा म्हणून राजाला
सादर केले जाते, तर जातक 504 मधे एका किन्नराचे आत्मचरित्रच वाचायला मिळते.
महाकवी कालिदास आपल्या ‘कुमारसंभव’ या नाटकात किन्नरांचे वर्णन करताना
म्हणतो की, यांचा अधिवास हा हिमालयात असतो, तर जातक 485 मध्ये असे सांगितले
आहे की हे किन्नर पंडारक, त्रिकुटक, मल्लनगिरी, चंदपबट आणि गंधमादन या
पर्वतांवरसुद्धा राहतात.
किन्नरांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी आहेत. त्या पुढच्या भागात बघू या.
asप्ल्tदेप्.trाक्s@gस्aग्त्.म्दस्
>> आशुतोष बापट
ग्रीक पुराणकथांमधील पंखधारी घोडा अर्थात पेगॅससबद्दल काही कथा आपण बघितल्या. याच पंखधारी घोडय़ाबद्दल अजून एक बाब म्हणजे कॉरिन्थच्या नाण्यांवर पंख असलेल्या पेगॅससचा छाप दिसून येतो. इ.स.पूर्व 4 थ्या शतकातील कॉरिन्थच्या चांदीच्या नाण्यावर पंखधारी पेगॅसस कोरलेला आहे. त्याच कालखंडात निर्माण झालेल्या लाम्पसॅकसच्या नाण्यांच्या मागच्या बाजूवरसुद्धा पंखधारी अश्वाचे शिल्प बघायला मिळते. म्हणजेच कलेमध्ये या पंखधारी घोडय़ाचे स्थान जसे शिल्पांमध्ये आहे तसेच ते नाण्यांवरसुद्धा दिसून येते. पंखधारी घोडय़ासारखा अजून एक चमत्कारिक प्राणी आपल्याला दिसतो तो म्हणजे पंखधारी हत्ती.
अमरावती, सांची, नागार्जुनकोंडा इथल्या उडणाऱया हत्तींची शिल्पे बुद्धजन्माच्या चमत्काराची घटना दाखवतात. या शिल्पांमधे जरी हत्तींना पंख दाखवले नसले तरीसुद्धा त्यांच्या शिल्पांवरून ते आकाशात विहार करताहेत हे स्पष्टपणे समजून येते. अर्थात हत्तींना पंख दाखवणे हे काही हिंदुस्थानी कलाकारांना अगम्य नव्हते. अमरावती इथल्या शिल्पांमधून आपल्याला पंख असलेले हत्ती शिल्पांकित केलेले बघायला मिळतात.
किन्नरींची शिल्पे ही किन्नरांच्या इतकी विपुलतेने दिसत नाहीत. किन्नरी ही सर्वसाधारणपणे किन्नरासोबतच दाखवलेली असते. अजिंठय़ाच्या चित्रकलेत किन्नर-किन्नरींची चित्रे फार सुरेख चितारलेली आहेत. अजिंठय़ाच्या भित्तीचित्रात हातात झांजा घेतलेल्या किन्नरीचे चित्र फारच लक्षवेधक आहे. विष्णुधर्मोत्तर पुराणात किन्नराचे वर्णन अर्धा माणूस आणि अर्धा घोडा असे आलेले आहे, परंतु बौद्ध धर्मीयांच्या समजुतीनुसार किन्नर म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा पक्षी होय. बोधगयेला एका यक्षाचे शिल्प आहे. तिथे त्या यक्षाचे डोके घोडय़ाचे आहे. वस्तुत ही एक किन्नरी असून जातकातील चित्रकथेनुसार तिला गंधर्व मानले गेले आहे. जातकातील नोंदीनुसार किन्नर हे परी वर्गातले असून ते नेहमी जोडीने जाताना दाखवतात. त्यातून त्यांचे एकमेकांप्रती प्रेम आणि निष्ठा दाखवली जाते. चंद किन्नर जातकात अशाच एकनिष्ठ प्रेमाचा दाखला दिलेला आहे. किन्नर हे दीर्घायुष्यासाठीदेखील प्रसिद्ध आहेत. जातकांमधून किन्नरांचे वर्णन करताना त्यांना निष्पाप आणि निरुपद्रवी दाखवतात. ते निरागसपणे पक्ष्यांसारखे उडय़ा मारतात, संगीत आणि गाण्याचे त्यांना वेड असते. किन्नरी झांजा वाजवते तर किन्नर बासरी वाजवतात. जातक 481 मध्ये या निरागस जिवांबद्दल अजून एक वर्णन आले आहे. त्यानुसार किन्नरांना पकडले जाते आणि पिंजऱयात बंदिस्त करून नजराणा म्हणून राजाला सादर केले जाते, तर जातक 504 मधे एका किन्नराचे आत्मचरित्रच वाचायला मिळते. महाकवी कालिदास आपल्या ‘कुमारसंभव’ या नाटकात किन्नरांचे वर्णन करताना म्हणतो की, यांचा अधिवास हा हिमालयात असतो, तर जातक 485 मध्ये असे सांगितले आहे की हे किन्नर पंडारक, त्रिकुटक, मल्लनगिरी, चंदपबट आणि गंधमादन या पर्वतांवरसुद्धा राहतात.
किन्नरांबद्दल अजून काही गमतीशीर गोष्टी आहेत. त्या पुढच्या भागात बघू या.
asप्ल्tदेप्.trाक्s@gस्aग्त्.म्दस्
आशुतोष बापट / वारसा वैभव
प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या व्यालप्रतिमा म्हणजेच मिथकशिल्पांचे देखणेपण उठून दिसते.
शंकराच्या मंदिरात गेल्यावर गाभाऱयाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले दिसते. कार्ल्याच्या लेणीत गेल्यावर तिथल्या खांबांवर कुणी चमत्कारिक प्राणी दिसतात. राशीपा बघताना धनु राशीचे चिन्ह दाखवताना अर्धा घोडा आणि अर्धा माणूस दाखवतात. काही काही देवळांवर चांगले तीन फूट उंचीचे प्राणी दिसतात. त्यांचे तोंड हत्तीचे असते आणि उरलेला देह सिंहाचा असतो. हंपीला गेल्यावर तिथल्या विठ्ठल मंदिराच्या खांबावर एक निराळाच प्राणी दिसतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव एकत्र करून घडवलेला हा प्राणी असतो. त्याचं नाव काही सांगता येत नाही. त्याचं नक्की रूप काय आहे हेदेखील समजत नाही. काय असतं हे सगळं? कशासाठी अशी रचना केलेली असते? या प्राण्यांची काही कथा आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची समाधानकारक उत्तरे काही मिळत नाहीत.
या सगळ्या प्राण्यांना मिथक प्राणी, पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक प्राणी असे म्हणतात. या सगळ्याचा एक सोपा शब्द नंतर समोर येतो तो म्हणजे ‘व्यालशिल्पे’. यांना व्याल असे संबोधले जाते. प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या प्रकाराला ‘व्याल’ असा शब्द जरी सध्या रूढ झालेला असला तरी हा शब्द साधारण इ.स.च्या 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल‘ असं म्हटलं गेलं आहे, त्याला आपण पौराणिक किंवा खरं तर काल्पनिक प्राणी म्हणू शकतो. हे असे प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली आहे ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. हिंदुस्थानी कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला प्राचीन साहित्यांतूनही मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.
प्राचीन हिंदुस्थानी साहित्यात विविध ग्रंथांसोबतच मत्स्य, लिंग, हरिवंश, वायू, ब्रह्म, वामन या पुराण ग्रंथांमधूनही विविध ठिकाणी इहामृगाचा उल्लेख आलेला आहे. किंबहुना पौराणिक लेखकांनी या इहामृगांची एक यादीच दिलेली आहे. गजानन, ह्यानन, सिंहानन, व्याघ्रानन, मृगेंद्रवदन, खरमुख, मकरानन, इहामृगमुख, काकमुख, गृद्धमुख अशी अनेक नावे या यादीत दिसून येतात. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक ‘रघुवंश’ यातही अर्धा हत्ती-अर्धा मत्स्य अशा एका दैत्याचा उल्लेख येतो.
इ.स.पूर्व दुसऱया शतकापासून लयनस्थापत्य महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. चैत्यगृह आणि विहार असे लेण्यांचे स्वरूप असते. लेणीचा दर्शनी भाग (फसाड) आकर्षकरीत्या कोरलेला दिसतो. लेण्यांमध्ये असलेल्या स्तंभांवर आपल्याला प्राणी कोरलेले दिसून येतात. बेडसे आणि कार्ले तसेच लेण्याद्री इथे या प्राण्यांच्या पाठीवर कुणी एकटा स्वार तर कधी दंपती बसलेली दाखवतात. मात्र या लेण्यांमधून खूप सुंदर असे संमिश्र प्राणी कोरलेले दिसून येतात. पितळखोरा, भाजे, जुन्नर, लेण्याद्री, नाशिकची पांडवलेणी या लेण्यांतून स्फिंक्स, सेंटॉर, किन्नर कोरलेले आहेत. म्हणजे नुसते सांची, अमरावती, मथुरा इथल्या कलेतच नाहीत तर या लेण्यांतूनही या पौराणिक प्राण्यांचे दर्शन कलाकारांनी आपल्याला करून दिले आहे. यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, माणसाचा चेहरा असलेला सिंह, पंख असलेले घोडे, हत्ती अशी विविधता दिसते. नाग व गरुडाचे मानवीकरण केलेली शिल्पे कोरलेली आहेत.
संमिश्र प्राणी किंवा संमिश्र पक्षी यांचे कलेतील सादरीकरण आपण सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा इथे तसेच अजिंठा इथल्या लेणींमधील चित्रकलेत बघितले. ‘इहामृग’ अर्थात संमिश्र प्राण्यांची संकल्पना पुढे ‘व्याल’ या संकल्पनेत परावर्तित झालेली दिसून येते आणि इ.स.च्या 6 व्या शतकानंतर बांधलेल्या अनेक मंदिरांवर हे व्याल किंवा असे संमिश्र प्राणी मोठय़ा प्रमाणावर कोरलेले दिसून येतात. हे व्याल कोरताना भिन्न प्राण्यांची शरीरे एकत्र करून हे काल्पनिक प्राणी कोरले गेले आहेत. एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया एका किंवा एकापेक्षा जास्त प्राण्यांच्या शरीराचे भाग एकत्र करून असे व्याल कोरले गेले. ज्या प्राण्याचे तोंड कोरलेले असेल त्याच्या नावाने तो व्याल ओळखला जातो. उदाहरणार्थ, हत्तीचे तोंड आणि शरीर सिंहाचे असे शिल्प असेल तर त्याला ‘गजव्याल’ असे म्हटले जाते. मग मकरव्याल, अश्वव्याल, अजव्याल, गणेशव्याल अशा असंख्य व्याल प्रतिमा मंदिरांवर कोरलेल्या दिसून येतात. खजुराहो इथल्या मंदिरांवर असे व्याल दिसून येतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर गडचिरोली जिह्यातल्या मार्कंडा मंदिरावर खूप मोठय़ा संख्येने व्याल कोरलेले आहेत. तारकाकृती आकारामुळे मंदिराच्या बाह्य भिंतीना अनेक कोन निर्माण होतात. उठाव असलेल्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात, तर त्या दोन मूर्तींच्या आतमध्ये असलेल्या कोनांवर व्याल प्रतिमा कोरलेल्या असतात. या व्याल प्रतिमांचे देखणेपण आणि त्यांचा ठसठशीतपणा प्रकर्षाने उठून दिसतो.
छत्तीसगडच्या पाली इथल्या मंदिरावर नरव्यालाची मूर्ती आहे. चेहरा माणसाचा आणि उर्वरित शरीर प्राण्याचे असा हा नरव्याल इथले मुख्य आकर्षण म्हणायला हवा. इथले व्यालसुद्धा हत्तीच्या पाठीवर दाखवलेले आहेत. याचा अर्थ हत्ती आणि या व्याल प्रतिमा यांचा काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता दिसते. या मंदिरावरचे व्याल फारच देखणे आहेत आणि देवतांना जसे विविध दागदागिने दाखवतात तसे विविध दागिने या व्यालांच्या अंगावर कोरलेले दिसतात. इतकी सुंदर शिल्पकला अर्थातच चकित करून टाकते. तत्कालीन कलाकारांची कलासक्त नजर आणि कुठलीही गोष्ट सादर करताना ती अतिशय मोहक रूपात सादर केली पाहिजे ही ओढ प्रकर्षाने जाणवते.
> ashutosh.treks@gmail.com
>> आशुतोष बापट
मागील लेखात आपण आकाशगामी म्हणजेच व्योमचरिन् या वर्गातले प्राणी बघायला सुरुवात केली होती. या प्रकारात एकापेक्षा एक आकर्षक आणि विस्मयकारक प्राणी भरलेले आहेत. त्यातल्या ग्रिफिनपर्यंत आपण येऊन पोचलो होतो. भारतीय कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. भारतीय कलेत दिसणाऱया ग्रिफिनच्या शिल्पासारखेच ग्रिफिनचे एक शिल्प मिलेटस इथल्या ग्रीक देवता अपोलोच्या मंदिरातील एका स्तंभावर कोरलेले दिसते. त्याशिवाय इ.स.पूर्व 4-5 व्या शतकातील तिओस आणि थ्रेसच्या नाण्यांवरसुद्धा ग्रिफिनचे शिल्प आढळून येते.
ग्रिफिनबद्दल काही सुरस कथा प्रसिद्ध आहेत. ग्रिफिन हे जगाच्या उत्तर टोकावर हायपरबोरीयनचे शेजारी म्हणून वास्तव्याला असतात. ते सोन्याच्या खजिन्याचे राखणदार असतात. या खजिन्यावर एकच डोळा असलेल्या अरिमास्पियन्सचे लक्ष असते. ते हा खजिना चोरण्याच्या प्रयत्नात असतात. ग्रिफिन, हायपरबोरीयन आणि अपोलो यांचेसुद्धा सुरेख संबंध या कथांमधून येतात. अपोलो या ग्रीकांच्या देवतेने हायपरबोरीयनसमवेत काही काळ घालवला होता. त्यामुळे हायपरबोरीयन्स हे पवित्र समजले गेले. कालांतराने अपोलो आणि हेलीयस या सूर्यदेवतांचे एकत्रीकरण झाले किंवा अपोलोलाच पुढे हेलीयस असे संबोधले जाऊ लागले तेव्हा हे ग्रिफिन हेलीयसचे सारथी झाले होते. हेलीयसचा रथ हे ग्रिफिन आकाशमार्गे ओढून नेतात असे वर्णन अनेक कथांमधून येते.
एखाद्या प्रांतातल्या लोकप्रिय झालेल्या लोककथा, त्यातले संदर्भ तसेच ठेवून किंवा त्यात काही जुजबी बदल करून जगाच्या विविध भागात प्रसारित होत असतात. ग्रिफिनच्या बाबतीत प्रसिद्ध असलेल्या अशाच काही कथांमधून ग्रिफिन्सचे वास्तव्य उत्तर भारतात असल्याचेही उल्लेख आलेले आहेत. उत्तर भारतात ग्रिफिन्सचे वास्तव्य होते. तिथे त्यांनी वाळवंटातून सोनेरी वाळू खणून काढली. त्यामुळे साहजिकच त्यांच्या शेजाऱयांचे त्या सोन्याच्या वाळूवर लक्ष गेले. ती वाळू त्यांना चोरायची तर होती, पण त्याच्या रक्षणासाठी बसलेले हे ग्रिफिन्स फारच उग्र आणि भयंकर होते. पण त्या शेजाऱयांना तर ती सोनेरी वाळू हवी होती. मग या ग्रिफिन्सच्या शेजाऱयांनी सोनेरी वाळू चोरण्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांनी ग्रिफिन्सना आवर्जून खायला आणून दिले आणि जेव्हा ग्रिफिन्स खाण्यात व्यग्र होते, तेव्हा त्यांनी ती सोनेरी वाळू चोरून नेली.
पंखधारी हरीण किंवा काळवीट
पंखधारी हरीण किंवा काळविटाची दोन शिल्पे आपल्याला सांचीला दिसतात. सांची स्तुपाच्या उत्तर तोरणावर पाठीला पाठ लावून बसलेल्या या दोन पंखधारी हरणांचे शिल्प आहे. टोकदार शिंगे असलेल्या या हरणांनी आपले पंख उंचावलेले आहेत. अतिशय मोहक आणि आकर्षक असे हे शिल्प आहे. यांनाच पुढे हरीण-व्याल म्हणून संबोधले जाऊ लागले. याच तोरणाच्या मागच्या बाजूवर पंखधारी काळविटाचे एकमेव शिल्प आहे. यालासुद्धा हरीण-व्याल असेच म्हणतात. सांचीसारखेच अमरावती आणि मथुरा इथे आपल्याला पंखधारी हरीण (हरीण-व्याल) शिल्पांकित केलेले दिसून येतात.
पंखधारी घोडा
उडणारे घोडे किंवा पंख असलेल्या घोडय़ाचे उल्लेख भारतीय आणि परकीय साहित्यातून जरी विपुल प्रमाणात दिसत असले, तरी त्या मानाने त्यांचे कलेमध्ये शिल्पांकन फारच थोडे दिसते. अशी शिल्पे दुर्मीळच म्हणायला हवीत. मात्र एक सुंदर शिल्प आपल्याला सांची स्तुपाच्या कठडय़ावर दिसते आणि दुसरे शिल्प अमरावती कलेमधे दिसून येते. हिंदू पौराणिक कथांमधून दिसणारा ‘उच्चैश्रवा’ नावाचा घोडा, हा या पंखधारी घोडय़ाचे मूळ रूप असण्याची शक्यता आहे.
बौद्ध साहित्यात बर्याच जातक कथा आहेत. या कथांमधून गौतम बुद्धाचे पूर्वीचे जन्म आणि त्यात त्याने समाजासाठी केलेले योगदान सांगितलेले असते. त्या जातक कथांच्या विषयानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. अशाच एका ‘वलहंस जातका’त या पंखधारी घोडय़ाचा उल्लेख येतो. या घोडय़ाचा संदर्भ बौद्ध संकल्पनेतील एका रत्नाशी आहे. तो असा की, बौद्ध संकल्पनेनुसार चक्रवर्तीपदाची काही लक्षणे आहेत. ज्यानुसार चक्रवर्ती हा सप्त रत्नांनी सुशोभित केलेला असतो. म्हणजेच त्याच्या बाजूने सात रत्ने दाखवलेली असतात. त्यातील एक रत्न म्हणजे वलह श्रेणीतला एक घोडा असतो. आणि म्हणून हा घोडा या जातककथेत दिसून येतो. या जातककथेनुसार हा घोडा, ‘विदुरपंडित’ जातकातल्या पुणक यक्षासारखा आकाशात उडू शकतो. बहुदा या कथांमधून आलेल्या उडणाऱया घोडय़ांच्या कल्पनेवरून, शिल्पकारांना प्रेरणा मिळाली असावी आणि म्हणून त्यांनी पुढे अशा उडणाऱया घोडय़ांची शिल्पे निर्माण केली असावीत.
ग्रीक पुराणकथांमधूनही उडणाऱया घोडय़ाचे उल्लेख येतात. तिथे पेगॅसस नावाच्या पंख असलेल्या घोडय़ाची कथा आहे. पॉसिडॉनचा मुलगा असलेला हा पेगॅसस. या पेगॅससचा एका पाण्याच्या झऱयाशी संबंध आलेला आहे. त्याच्या जन्माची कथा मोठी रंजक आहे. त्याच्या आईचे डोके पर्सियसने कापले. त्यानंतर तिच्या रक्तबंबाळ शरीरातून हा पेगॅसस जोरदार उसळी मारून बाहेर पडला. तो फारच उत्तेजित झालेला होता. जन्माला आल्यावर त्याने आकाशात उंच झेप घेतली. तो पहिल्यांदा जिथे विश्रांतीसाठी थांबला ते ठिकाण म्हणजे कॉरीन्थचे एक्रोपोलीस होते. नंतर तो जेव्हा पेरेनाच्या कारंज्यापाशी पाणी पिण्यासाठी थांबला तेव्हा अथेन आणि पॉसिडॉनच्या मर्जीने बेलेरोफोन याने पेगॅससला शांत केले आणि तो त्याच्यावर स्वार झाला. याच पेगॅससवर आरूढ होऊन बेलेरोफोनने युद्धात मोठमोठे विजय मिळवले. चिमेरावर मिळवलेला विजय हा त्यातल्याच एक होय. पुढे पेगॅससने त्याच्या बेलेरोफोन या स्वाराला धुडकावून लावले आणि तो उंच उंच उडत पार स्वर्गात गेला. तिथे त्याने झ्यूसबरोबर वास्तव्य केले. वीज आणि ढगांचा गडगडाट आणण्याच्या कामात त्याने झ्यूसला मोलाची मदत केली. काही लेखकांनी पेगॅससला इरॉस किंवा म्युझेसचा अश्व म्हणून संबोधले आहे. पेगॅससने ज्या ठिकाणी हेलीकॉनला आपल्या खुराने मारले, त्या ठिकाणी पाण्याचा झरा उत्पन्न झाला. ज्याला ‘अश्वाचा झरा’ असे नाव पडले. ट्रोजनजवळ असलेला हिप्पोक्रीन नावाचा झरा आणि अक्रोकोरीन्थस जवळचा पिरेन झरा यांच्या उत्पत्तीची कथासुद्धा अशीच सांगितली जाते.
ashutosh.treks@gmail.com
>> आशुतोष बापट
आपण बघितले की, के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग, व्याल किंवा जे काल्पनिक प्राणी वर्णन करून सांगितले आहेत, ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्) आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्). काल्पनिक प्राणी चित्रित किंवा शिल्पांकित करताना त्या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांवरून त्यांचे वर्गीकरण तीन प्रकारांत केलेले आहे. मूलत तो प्राणी कोण आणि त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार करून हे प्रकार ढोबळमानाने ठरवले गेले आहेत. प्राणी कुठल्या गटात बसतो वगैरे तांत्रिक बाबी सोडल्या जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, प्राण्यांचे नवीन रूप, काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य यांचा ऊहापोह के. कृष्णमूर्तींनी केलेला आहे. या तीन वर्गीकरणांतला पहिला प्रकार आहे तो आकाशात उडणारे प्राणी. त्यांना ‘व्योमचरिन्’ असे म्हटले आहे.
आकाशगामी (व्योमचरिन्) – आकाशगामी म्हटले की, साहजिकच उडणे ही क्रिया अपेक्षित आहे आणि उडणे या क्रियेशी जोडला गेलेला अवयव म्हणजे पंख. त्यामुळे प्राणी जरी संमिश्र असला तरी त्याला पंख दाखवले की, तो उडणारा आहे हे लगेच समजून येते. ‘आकाशगामी’ या नावातच स्पष्ट होतं की, असे संयुक्त, काल्पनिक प्राणी (व्याल) ज्यांना पंख दाखवलेले असतील, त्यामुळे या प्रकारात जे प्राणी समाविष्ट केले आहेत त्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे बघता येतील. यामध्ये पंखधारी सिंह, पंखधारी आणि शिंग असलेले सिंह, ग्रिफिन म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी हरीण, काळवीट, पंखधारी घोडे, पंखधारी हत्ती, किन्नर आणि किन्नरी, पंखधारी आणि हत्तीमुखी बैल म्हणजे पंखधारी गरुडरूपी सिंह, पंखधारी पाणमांजर, पंखधारी बकरी, सिंहमुखी कोंबडा, पंखधारी आणि सिंहाचे शरीर असलेले पुरुष आणि स्त्राr, पाच फणे असलेला नाग आणि गरुड, पक्ष्याचे शरीर असलेली स्त्राr. एवढय़ा विविधतेचे प्राणी आपल्याला ‘आकाशगामी’ म्हणजे ‘व्योमचरिन्’ या श्रेणीमध्ये सापडतात. या प्राण्यांचे शिल्पांकन किंवा चित्रांकन कुठे केलेले आहे तेसुद्धा बघू या.
पंखधारी सिंह – पंखधारी सिंह दाखवताना सिंहाच्या पुढच्या पायाच्या बाजूने बाहेर आलेले पंख दाखवलेले असतात. त्यामुळे हे जणू आकाशातून विहार करणारे कुणी राक्षसच असावेत असा बघणाऱयाला भास होतो. हे पंखधारी सिंह शक्यतो कुठल्या तरी खांबांच्या शीर्षस्थानी कोरलेले असतात. शीर्षस्थानी कोरल्यामुळे उंचावर असलेले त्यांचे अस्तित्व ते प्राणी आकाशगामी असल्याचे दर्शवतात. अशा उंचावर कोरल्यामुळे या प्रजातीचे वास्तव्य अंतरिक्षात असते असे शिल्पकाराला ठळकपणे दाखवून द्यायचे असते. शिल्पकलेमधे पंखधारी सिंह हा बऱयाच ठिकाणी आढळतो. त्यातही विशेषकरून बघायचे झाल्यास सांची इथले शिल्प, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा इथली शिल्पे आपल्याला प्रामुख्याने विचारात घ्यावी लागतील. यातही एक आश्चर्यकारक गोष्ट दिसून येते ती म्हणजे वाकाटक-गुप्त काळात हा प्रकार कलाकारांमध्ये फारसा लोकप्रिय नव्हता असे दिसते. कारण या काळातील अजिंठा लेण्यांमधील चित्रकलेत असे पंखधारी सिंह कुठेही दिसत नाहीत. तस गांधार कलेच्या कलाकारांनीसुद्धा यांचे शिल्पांकन आपल्या शिल्पकलेत केलेले दिसत नाही.
हिंदुस्थानी साहित्यात याचा उल्लेख ‘वाल्मीकी रामायणा’त ‘सिंहा: पक्षगम:’ असा केलेला आहे (रामायण, किष्किंधा 42, 16) त्या उल्लेखानुसार या पंखधारी सिंहांचे वास्तव्य जिथे सिंधू नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी असलेल्या सोमगिरी पर्वतावर होते. या स्थानाला पश्चिम दिशेचे टोक म्हणजे शेवटचे स्थान असे म्हटलेले आहे. यावरून असाही एक अंदाज बांधता येतो की, लेखकाने इराण, मेसोपोटेमिया इथल्या पारंपरिक कलाकृतींच्या पार्श्वभूमीवर हे लेखन केले असावे. कारण त्या प्रदेशात अशा अजस्र आकाराची शिल्पनिर्मिती केली जात असे. या शिल्पकृतींच्या कथा त्या देशांतून समुद्रमार्गे येणारे व्यापारी आणि प्रवासी यांच्याकडून लेखकाने ऐकलेल्या असणार आणि त्यानुसार त्याने आपल्या लिखाणात त्यांचा उल्लेख केलेला असणार. याचेच काही नमुने एका उत्खननात सापडले आहेत. इ.स.पूर्व 5 व्या शतकातल्या अॅकिमेनिड काळातला तो नमुना आहे. इकबाटन इथे झालेल्या उत्खननात काही सोन्याची भांडी मिळाली, ज्यावर पंखधारी सिंहाचे शिल्प कोरलेले सापडले. हमादान इथल्या उत्खननात कपडय़ावर लावायच्या सोन्याच्या बटणाच्या रूपात पंखधारी सिंह सापडले. तसेच पर्सिपोलीस इथल्या उत्खननात तलवारीच्या म्यानावर पंखधारी सिंहाची आकृती कोरलेली मिळाली.
पंखधारी शिंग असलेला सिंह – प्राचीन हिंदुस्थानी मूर्तींमध्ये अशा प्रकारच्या सिंहाचे शिल्प अगदी क्वचितच आढळते, पण जी शिल्पे उपलब्ध आहेत, त्यातले सर्वात सुंदर असे शिल्प सांची इथे आहे. पंखधारी, शिंग असलेला हा सिंह असून त्याच्या पाठीवर एक स्वार बसला आहे. त्या स्वाराने हातात लगाम धरलेला दाखवलेला आहे. काहीसा उग्र दिसणारा हा प्राणी आपल्याला सांची इथे बघायला मिळतो. याच्या तुलनेत अमरावती आणि नागार्जुनकोंडा इथे असलेले पंखधारी शिंग असलेले सिंहाचे शिल्प अगदीच साधे आहे.
ग्रिफिन (पंखधारी गरुडरूपी सिंह)
सिंहाचे
शरीर, गरुडाची किंवा पोपटाची चोच आणि गरुडाचे पंख असलेला हा संमिश्र
प्राणी. या प्राण्यांचे शिल्पांकन आपल्याला सांची इथे बऱयाच प्रमाणावर
आढळते. चारही पाय दुमडून बसलेला हा प्राणी आपले पंख फुलवून मागे वळून बघतो
आहे असे हे शिल्प. इथे सिंहाची आयाळ ठसठशीतपणे दाखवलेली आहे. सांची
स्तूपाच्या पश्चिम तोरणावर समोरच्या बाजूला एकतर मागच्या बाजूला दोघे
पाठीला पाठ लावून बसलेले ग्रिफिन आपल्याला दिसतात. इथेच 2 ाढमांकाच्या
स्तूपाच्या कठडय़ावर अशा ग्रिफिनचे शिल्पांकन केलेले आहे. अशाच प्रकारचा एक
ग्रिफिन मथुरा कलेमध्येसुद्धा बघायला मिळतो.
हिंदुस्थानी कलेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रिफिन हे नंतरच्या काळात दिसणाऱया श्येन, गरुड आणि शुक-व्याल या संकल्पनेचे प्राथमिक रूप म्हणता येईल. या ग्रिफिनच्या काही सुरस कथा आहेत. त्या पुढच्या भागात बघू या.
>> आशुतोष बापट
साहित्यातील संदर्भ पाहिल्यानंतर आपण या काल्पनिक विश्वातील प्राण्यांचे अजून कुठे कुठे संदर्भ येतात हे शोधायला गेलो की, अर्थातच कलेमध्ये त्याचे पडलेले प्रतिबिंब स्पष्ट दिसून येते. मुळात साहित्यात जे संदर्भ आले आहेत त्याचे रूपांतर कलेत होणे हे अगदी क्रमप्राप्तच आहे म्हणा. ‘मिथीकल अॅनिमल्स इन इंडियन आर्ट’ या आपल्या पुस्तकात श्री. के. कृष्णमूर्ती यांनी या संकल्पनेचा सगळा ऐतिहासिक आढावा घेतलेला आहे. त्या पुस्तकावर आधारित असलेले आणि अजून बरेच निरनिराळे संदर्भ जोडून प्रसाद प्रकाशनाने ‘मिथक शिल्पे’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात के. कृष्णमूर्ती यांनी विचारात घेतलेली ‘इहामृग’ ही संकल्पना, त्याचे कलेत पडलेले प्रतिबिंब हे मांडले आहेच, पण त्याशिवाय श्री. ढाकी यांनी पुढे मांडलेली ‘व्याल’ ही संकल्पना आणि त्याचे हिंदुस्थानी कलेत दिसणारे रूप याचासुद्धा विचार केला आहे. तसेच के. कृष्णमूर्ती यांनी सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा इथली शिल्पे आणि अजिंठा लेणीतील भित्तिचित्रे यांचाच समावेश त्यांच्या पुस्तकात केला आहे. मात्र मराठी पुस्तकात विविध लेण्यांमध्ये दिसणारे हे काल्पनिक प्राणी आणि पुढे मंदिरांवर विपुल प्रमाणावर दिसणाऱया व्याल प्रतिमा यांचासुद्धा समावेश केलेला आहे.
के. कृष्णमूर्ती यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की, त्यांनी फक्त इ.स.च्या 6व्या शतकापर्यंतचा कालावधी लक्षात घेऊन त्या कालावधीत आढळणारी मिथक शिल्पे विचारात घेतली आहेत. कारण पुढे श्री. ढाकी यांनी ‘व्याल’ ही संकल्पना त्यांच्या पुस्तकातून विस्तृतपणे उलगडून दाखवली. त्यांनी ‘द व्याल फिगर्स ऑन द मेडिएव्हल टेंपल्स ऑफ इंडिया’ या त्यांच्या पुस्तकात ‘व्याल’ या संकल्पनेबद्दल खूप सखोल अभ्यास मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे इ.स.च्या 4थ्या शतकापासून ‘व्याल’ ही संकल्पना विकसित झाल्याचे दिसून येते.
वर म्हटल्याप्रमाणे श्री. के. कृष्णमूर्ती यांनी इहामृगाचे कलेतील संदर्भ शोधण्यासाठी भारहूत, सांची, अमरावती, नागार्जुनकोंडा, मथुरा आणि गांधार इथली शिल्पे आणि अजिंठा लेण्यांतली चित्रे यांचा विचार इथे केला आहे. हिंदुस्थानी कलेवर परदेशी कलेचा किती प्रभाव पडतो हेसुद्धा इथे दिसून येते. शिल्पातून दिसणारे हे इहामृग म्हणजे कलाकारांच्या अफलातून कल्पनाशक्तीतून निर्माण झालेला एक सुंदर कलाविष्कार आहे. प्राचीन कलेत अशा काल्पनिक किंवा पौराणिक प्राण्यांची विविधता फार मोठी आहे. ते प्राणी किती आहेत आणि कोणकोणते आहेत याची एक झलक बघायची म्हटली तर आपल्या समोर कलेचे एक मोठे दालनच उघडले जाते. ज्यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, शिंग असलेला सिंह, किन्नर-किन्नरी, चेहरा माणसाचा आणि शरीर सिंहाचे किंवा हत्तीचे असा प्राणी, अर्धा माणूस आणि अर्धा घोडा, हत्तीचे तोंड असलेला माणूस, बकरीचे तोंड असलेला माणूस, सिंह-मगर-माशाची शेपूट असा संयुक्त प्राणी, पंख असलेले हरीण, पंख असलेला बैल, हत्तीचे तोंड आणि पंख असलेला बैल, पंख असलेली बकरी, गरुडाचे शरीर आणि पंख असलेला पुरुष किंवा स्त्री, नरसिंह आणि त्याला पंख, सिंह-मगर, हत्ती-मासा, हरणाला माशाची शेपूट, बकरीला माशाची शेपूट, हत्तीला विंचवाची शेपूट, सिंहाचे पंजे असलेला बैल आणि त्याला माशाची शेपूट, माशाची शेपूट असणारी जलपरी, घोडय़ाचे तोंड असलेला समुद्री मासा ज्याला हॉर्सफिश असे म्हणतात, पंख असलेली बकरी आणि तिला माशाची शेपूट असे अक्षरश अगणित व्याल प्रकार आपल्या प्राचीन हिंदुस्थानी कलेत दिसून येतात.
या काल्पनिक संमिश्र प्राण्यांबद्दल कलाकारांच्या मनात काय कमालीचे आकर्षण होते आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीची झेप किती अफाट होती हे यावरून दिसून येते. कुठल्याही दोन भिन्न प्राण्यांच्या शरीराचे विशिष्ट भाग एकत्र करून एक नवीनच प्राणी सादर करायचा असा जणू छंदच त्यांना जडला होता. या संकल्पनेचे कलेमध्ये सादरीकरण करताना या कलाकारांची कल्पनाशक्ती किती अचाट होती याची जाणीव, हे सगळे व्याल बघताना आपल्याला प्रकर्षाने होते. हे सगळे इतक्या मोठय़ा संख्येने असलेले आणि विविध प्रकारचे प्राणी आपल्यासमोर सांगताना त्यांची वैशिष्टय़ानुसार निरनिराळ्या गटात विभागणी केली आहे. हे एवढे सगळे विविध प्रकार एकत्र करताना त्यांची काही वैशिष्टय़े लक्षात घेऊन ती इथे सादर केली आहेत. त्यांचे अवयव किंवा कुठल्या प्राण्याचे अवयव त्यांना जोडले आहेत हे विचारात घेऊन त्यांचे साधारण वर्गीकरण केले आहे. के. कृष्णमूर्तींनी त्यांच्या पुस्तकात हे इहामृग किंवा व्याल मांडताना ते साधारणत तीन प्रकारांत विभागले आहेत. आकाशगामी प्राणी (व्योमचरिन्), जमिनीवरचे प्राणी (भूचरिन्), आणि पाण्यातले प्राणी (जलचरिन्) असे हे तीन प्रकार होत. या प्राण्यांना दाखवलेल्या विशिष्ट अवयवांमुळे त्यांचे वर्गीकरण अशा तीन प्रकारांत केलेले आहे. यातले काही प्राणी दोन गटांतसुद्धा मोडतात. मूलत तो प्राणी कोण आहे आणि मग त्याला कुठले अवयव जोडले आहेत याचा विचार इथे केला आहे. मूलत तो प्राणी जर जमिनीवरचा असेल आणि त्याला पंख जोडले असतील तर त्याचा समावेश आकाशगामी प्राण्यात केला आहे. त्याचे बदललेले रूप कोणते आहे यावर तो कुठल्या गटात बसतो हे ठरवले आहे. या काही तांत्रिक बाबी जरी असल्या तरी यातली नाटय़मयता, त्या प्राण्यांचे नवीन तयार झालेले रूप, त्यातल्या काही प्राण्यांचे परकीय कलेशी असलेले साधर्म्य किंवा पूर्णपणे परदेशी कलेतच त्यांचा असलेला आढळ यांचा ऊहापोह त्या त्या वेळी केलेला आहे. के. कृष्णमूर्तींनी तर अनेक प्राण्यांच्या कथा, लोककथा यांचे खूप रंजक वर्णन केले आहे. यातल्या प्रत्येक प्रकारातील गमतीशीर प्राणी आपण इथे बघणार आहोत.
ashutosh.treks@gmail.com
>> आशुतोष बापट
प्राचीन भारतीय मंदिरे, लेणी हे आपले स्थापत्य वैभव. आपल्या पूर्वसुरींनी निर्माण केलेले हे स्थापत्य आज आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाची, सामर्थ्याची आणि वैभवाची गाथा सांगतात. मंदिरे, मूर्ती, मंदिरांची रचना, त्यांचे स्थापत्य अशा अनेक विषयांवर विविध अभ्यासकांनी विपुल लेखन केले आहे. मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र हा विषयच मुळी असा आहे की, त्यावर विविधांगांनी अभ्यास करता येतो. त्यावर लेखन करता येते आणि मग त्यातले निरनिराळे पैलू उलगडून दाखवता येतात. मंदिर हे केवळ त्या देवाचे निवासस्थान न राहता ती एक सामाजिक संस्था होऊन जाते. समाजात घडणाऱया विविध गोष्टींचे प्रतिबिंब मंदिरांवर निरनिराळ्या शिल्पांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळते. मग कधी ही शिल्पे युद्धाची असतात, कधी माणसाच्या दैनंदिन जीवनात घडणाऱया प्रसंगांची असतात, कधी देवदेवतांची असतात, तर कधी कामशिल्पेसुद्धा मंदिरावर कोरलेली आढळतात. या प्रत्येक शिल्पाच्या तिथे असण्याला काहीतरी अर्थ असतो, त्याचे काहीना काही प्रयोजन असते. उगाचच जागा आहे म्हणून कुठलेसे शिल्प मंदिरावर कोरले आहे असे अजिबात होत नाही. मग त्या शिल्पामागे कुठलीशी पौराणिक कथा असेल, त्या-त्या विशिष्ट देवतेचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्या देवतेचे सामर्थ्य दाखवणारी ती शिल्पे असतील किंवा कुठल्या तत्त्वज्ञानाची ओळख त्या विशिष्ट शिल्पाच्या माध्यमातून करून दिलेली असेल. प्रत्येक शिल्प हे काहीतरी प्रयोजन घेऊनच मंदिरावर विराजमान झालेले असते. त्यामुळे या शिल्पांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर विविधता दिसून येते. त्यांचे विषय वेगळे, त्यांची शैली वेगळी, त्यांची तऱ्हाच निराळी.
मंदिरांवर, लेणींमध्ये किंवा विविध स्थापत्यावर दिसणाऱया विविध शिल्पांमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे शिल्पांकन बघायला मिळते आणि यातसुद्धा संमिश्र प्राणी आणि पक्षी कोरलेले जेव्हा दिसून येतात तेव्हा ते बघून नक्कीच आश्चर्य वाटते. काय प्रयोजन असेल असे संमिश्र प्राणी-पक्षी इथे कोरण्याचे हे समजून येत नाही. वाघ, सिंह, मोर, गरुड, नंदी असे प्राणी आपण समजू शकतो. विविध देवतांची ती वाहने म्हणूनसुद्धा त्यांचे शिल्पांकन मंदिरावर केलेले आढळते. मात्र कधी कधी माणसाचे तोंड आणि सिंहाचे शरीर किंवा शिंग असलेला सिंह आणि पंख असलेला बैल असे जेव्हा शिल्पांकन केलेले दिसते तेव्हा मात्र यामागचे कारण काय असेल ते समजत नाही. ही शिल्पे उगाचच कोरली असतील का? की ही शिल्पे म्हणजे कलाकारांचा निव्वळ कल्पनाविलास असेल? फक्त भारतातच अशी शिल्पकला दिसून येते की जगभर हा प्रकार दिसतो? अशा संमिश्र शिल्पांना काय म्हणतात? यांचे संदर्भ कुठे साहित्यात म्हणा किंवा शास्त्रग्रंथात दिसून येतात का? असे असंख्य प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात आणि मग त्या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलो की, एकेक सुंदर आणि आश्चर्यकारक गोष्टी समोर येऊ लागतात. शिल्पकलेतील एक निराळेच दालन आपल्या समोर उघडले जाते. थक्क करणाऱया विविध कथा समोर येतात आणि मग आपण शिल्पकलेतील या रंजकतेचा मागोवा घेऊ लागतो. संमिश्र प्राणी, काल्पनिक प्राणी किंवा पौराणिक प्राणी अशी विविध नावे घेऊन ही शिल्पे आपल्या समोर येतात आणि त्यांचे अंतरंग उलगडू लागतात.
या लेखमालेत आपण मंदिरांवर, लेणींमध्ये आणि विविध स्थापत्यांवर कोरलेले पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक संमिश्र प्राणी यांची माहिती घेणार आहोत. इंग्रजीत या प्राण्यांना ‘मिथिकल अॅनिमल’ असे संबोधले जाते. याचा शब्दश अर्थ ‘पौराणिक प्राणी’ असा होतो. मात्र याचा पौराणिक प्राण्यांबरोबरच काल्पनिक प्राणी असाही उल्लेख असायला हवा. कारण महाकाव्ये, पुराणे यातून उल्लेख आलेले हे प्राणी मुळात काल्पनिक आहेत. माणसाच्या कल्पनाविलासातून त्यांची निर्मिती झाली आहे. साहित्यात त्यांची निर्मिती होताना मुख्यत्वे दोन विविध प्राण्यांचे एकत्रीकरण करून एखाद्या प्राण्याचे चित्रण केले गेले आहे. एका प्राण्याचे डोके आणि दुसऱया प्राण्याचे धड यांच्या एकत्रीकरणातून असे प्राणी कल्पिले गेले.
प्राचीन भारतीय कलेचा अभ्यास करताना, विशेषत शिल्पकला आणि चित्रकला या कला विविध विषयांनी, देवदेवतांच्या कथांनी आणि त्यावर आधारित शिल्पांनी, पानाफुलांच्या सजावटींनी बहरलेल्या दिसतात. याशिवाय विविध पशुपक्षी यांचाही इथे समावेश होतो. या लेखमालेचा विषय हा प्राचीन भारतीय कलेत दिसणाऱया पशुपक्ष्यांशीच निगडित आहे. जरी हा विषय भारतीय कलेत दिसणाऱया पशुपक्ष्यांसंबंधी असला तरी इथे पशुपक्ष्यांचे निव्वळ वर्णन नसून, निरनिराळ्या पशुपक्ष्यांचे एकत्रीकरण करून तयार झालेले विलक्षण, मोहक असे काल्पनिक प्राणिविश्व आणि त्यांच्यामुळे बहरलेली भारतीय कला दाखवण्याचा प्रयत्न या लेखमालेत केला आहे.
ashutosh.treks@gmail.com
आशुतोष बापट / वारसा वैभव
प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या व्यालप्रतिमा म्हणजेच मिथकशिल्पांचे देखणेपण उठून दिसते.
शंकराच्या मंदिरात गेल्यावर गाभाऱयाच्या उंबरठय़ावर एक राक्षसाचे तोंड कोरलेले दिसते. कार्ल्याच्या लेणीत गेल्यावर तिथल्या खांबांवर कुणी चमत्कारिक प्राणी दिसतात. राशीपा बघताना धनु राशीचे चिन्ह दाखवताना अर्धा घोडा आणि अर्धा माणूस दाखवतात. काही काही देवळांवर चांगले तीन फूट उंचीचे प्राणी दिसतात. त्यांचे तोंड हत्तीचे असते आणि उरलेला देह सिंहाचा असतो. हंपीला गेल्यावर तिथल्या विठ्ठल मंदिराच्या खांबावर एक निराळाच प्राणी दिसतो. वेगवेगळ्या प्राण्यांचे अवयव एकत्र करून घडवलेला हा प्राणी असतो. त्याचं नाव काही सांगता येत नाही. त्याचं नक्की रूप काय आहे हेदेखील समजत नाही. काय असतं हे सगळं? कशासाठी अशी रचना केलेली असते? या प्राण्यांची काही कथा आहे का? असे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात आणि त्याची समाधानकारक उत्तरे काही मिळत नाहीत.
या सगळ्या प्राण्यांना मिथक प्राणी, पौराणिक प्राणी किंवा काल्पनिक प्राणी असे म्हणतात. या सगळ्याचा एक सोपा शब्द नंतर समोर येतो तो म्हणजे ‘व्यालशिल्पे’. यांना व्याल असे संबोधले जाते. प्राणी वा पक्ष्यांचे एकत्रीकरण किंवा त्यांचे संमिश्र रूप म्हणजे एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया प्राण्याचे शरीर अशी संयुक्त रचना करून तयार केलेली शिल्पे आपल्याला प्राचीन काळापासून हिंदुस्थानी कलेत दिसून येतात. या प्रकाराला ‘व्याल’ असा शब्द जरी सध्या रूढ झालेला असला तरी हा शब्द साधारण इ.स.च्या 6 व्या शतकानंतर वापरला जाऊ लागला. संयुक्त प्राणी ज्याला इंग्रजीत ‘मिथीकल अॅनिमल‘ असं म्हटलं गेलं आहे, त्याला आपण पौराणिक किंवा खरं तर काल्पनिक प्राणी म्हणू शकतो. हे असे प्राणी कलेत दाखवणे ही कलाकाराच्या कल्पनाशक्तीची भरारी म्हणावी लागेल. कलाकारांच्या या कल्पनाशक्तीला जोड मिळाली आहे ती या प्राण्यांच्या साहित्यातून येणाऱया वर्णनांची आणि त्याचबरोबर परकीय कलेच्या प्रभावाची. हिंदुस्थानी कलेमध्ये अशा संयुक्त प्राण्यांच्या वापराचे संदर्भ आपल्याला प्राचीन साहित्यांतूनही मिळतात. साहित्यात अशा प्राण्यांना ‘इहामृग’ असे म्हटले गेले आहे.
प्राचीन हिंदुस्थानी साहित्यात विविध ग्रंथांसोबतच मत्स्य, लिंग, हरिवंश, वायू, ब्रह्म, वामन या पुराण ग्रंथांमधूनही विविध ठिकाणी इहामृगाचा उल्लेख आलेला आहे. किंबहुना पौराणिक लेखकांनी या इहामृगांची एक यादीच दिलेली आहे. गजानन, ह्यानन, सिंहानन, व्याघ्रानन, मृगेंद्रवदन, खरमुख, मकरानन, इहामृगमुख, काकमुख, गृद्धमुख अशी अनेक नावे या यादीत दिसून येतात. कालिदासाचे प्रसिद्ध नाटक ‘रघुवंश’ यातही अर्धा हत्ती-अर्धा मत्स्य अशा एका दैत्याचा उल्लेख येतो.
इ.स.पूर्व दुसऱया शतकापासून लयनस्थापत्य महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. चैत्यगृह आणि विहार असे लेण्यांचे स्वरूप असते. लेणीचा दर्शनी भाग (फसाड) आकर्षकरीत्या कोरलेला दिसतो. लेण्यांमध्ये असलेल्या स्तंभांवर आपल्याला प्राणी कोरलेले दिसून येतात. बेडसे आणि कार्ले तसेच लेण्याद्री इथे या प्राण्यांच्या पाठीवर कुणी एकटा स्वार तर कधी दंपती बसलेली दाखवतात. मात्र या लेण्यांमधून खूप सुंदर असे संमिश्र प्राणी कोरलेले दिसून येतात. पितळखोरा, भाजे, जुन्नर, लेण्याद्री, नाशिकची पांडवलेणी या लेण्यांतून स्फिंक्स, सेंटॉर, किन्नर कोरलेले आहेत. म्हणजे नुसते सांची, अमरावती, मथुरा इथल्या कलेतच नाहीत तर या लेण्यांतूनही या पौराणिक प्राण्यांचे दर्शन कलाकारांनी आपल्याला करून दिले आहे. यात पंख असलेला सिंह, चोच असलेला सिंह, माणसाचा चेहरा असलेला सिंह, पंख असलेले घोडे, हत्ती अशी विविधता दिसते. नाग व गरुडाचे मानवीकरण केलेली शिल्पे कोरलेली आहेत.
संमिश्र प्राणी किंवा संमिश्र पक्षी यांचे कलेतील सादरीकरण आपण सांची, भारहूत, अमरावती, नागार्जुनकोंडा इथे तसेच अजिंठा इथल्या लेणींमधील चित्रकलेत बघितले. ‘इहामृग’ अर्थात संमिश्र प्राण्यांची संकल्पना पुढे ‘व्याल’ या संकल्पनेत परावर्तित झालेली दिसून येते आणि इ.स.च्या 6 व्या शतकानंतर बांधलेल्या अनेक मंदिरांवर हे व्याल किंवा असे संमिश्र प्राणी मोठय़ा प्रमाणावर कोरलेले दिसून येतात. हे व्याल कोरताना भिन्न प्राण्यांची शरीरे एकत्र करून हे काल्पनिक प्राणी कोरले गेले आहेत. एका प्राण्याचे तोंड आणि दुसऱया एका किंवा एकापेक्षा जास्त प्राण्यांच्या शरीराचे भाग एकत्र करून असे व्याल कोरले गेले. ज्या प्राण्याचे तोंड कोरलेले असेल त्याच्या नावाने तो व्याल ओळखला जातो. उदाहरणार्थ, हत्तीचे तोंड आणि शरीर सिंहाचे असे शिल्प असेल तर त्याला ‘गजव्याल’ असे म्हटले जाते. मग मकरव्याल, अश्वव्याल, अजव्याल, गणेशव्याल अशा असंख्य व्याल प्रतिमा मंदिरांवर कोरलेल्या दिसून येतात. खजुराहो इथल्या मंदिरांवर असे व्याल दिसून येतात. महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर गडचिरोली जिह्यातल्या मार्कंडा मंदिरावर खूप मोठय़ा संख्येने व्याल कोरलेले आहेत. तारकाकृती आकारामुळे मंदिराच्या बाह्य भिंतीना अनेक कोन निर्माण होतात. उठाव असलेल्या भिंतींवर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात, तर त्या दोन मूर्तींच्या आतमध्ये असलेल्या कोनांवर व्याल प्रतिमा कोरलेल्या असतात. या व्याल प्रतिमांचे देखणेपण आणि त्यांचा ठसठशीतपणा प्रकर्षाने उठून दिसतो.
छत्तीसगडच्या पाली इथल्या मंदिरावर नरव्यालाची मूर्ती आहे. चेहरा माणसाचा आणि उर्वरित शरीर प्राण्याचे असा हा नरव्याल इथले मुख्य आकर्षण म्हणायला हवा. इथले व्यालसुद्धा हत्तीच्या पाठीवर दाखवलेले आहेत. याचा अर्थ हत्ती आणि या व्याल प्रतिमा यांचा काहीतरी संबंध असण्याची दाट शक्यता दिसते. या मंदिरावरचे व्याल फारच देखणे आहेत आणि देवतांना जसे विविध दागदागिने दाखवतात तसे विविध दागिने या व्यालांच्या अंगावर कोरलेले दिसतात. इतकी सुंदर शिल्पकला अर्थातच चकित करून टाकते. तत्कालीन कलाकारांची कलासक्त नजर आणि कुठलीही गोष्ट सादर करताना ती अतिशय मोहक रूपात सादर केली पाहिजे ही ओढ प्रकर्षाने जाणवते.
शिराळशेट
१३८५ च्या सुमारास महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी
बहामनी राजवट होती व महमूदशहा बहायनीचे महाराष्ट्रावर राज्य होते. हा राजा प्रजादक्ष
होता. या राजाने गुलबर्गा, बिदर, कंधार, दौलताबाद, एलिचपूर, चौल व दाभोड या ठिकाणी अनाथालये
उघडली होती. त्याच्या राज्यात शिराळशेट (
श्रावण शुद्ध षष्ठीला शिराळशेठच्या प्रतिमांचे पूजन होते. आदल्या दिवशी तेथील कुंभाराकडे पाट दिला जाई व त्या पाटावर कुंभार शिराळशेठची बैलावर बसलेली प्रतिमा, शिराळशेठपुढे त्याचा श्वान व घरातील मंडळी असा देखावा केलेला असतो. या सर्वाची करडीच्या बिया, पताका आदी गोष्टींनी आरास केलेली असते. असा सजवलेला पाट आणून शिराळशेठची पूजा होते व संध्याकाळी त्याचे विसर्जन केले जाते.
पूर्वी पुण्यात श्रावणात महिनाभर अनेक ठिकाणी शिराळशेठचा मातीचा पुतळा बसवला जात असे. हा पुतळा आतून पोकळ व पोटाच्या जागी मागून मोकळा असे. त्यात भुसा, धलप्या इ. घालून त्याचा धूर शिराळशेठच्या तोंडातल्या चिलमीतून धूर निघत असे.
शिराळशेठने साडेतीन घटकांचे राज्यपद मागून आपली अनेक मंदिरे बहामनी राजांच्या जप्तीतून मुक्त केली म्हणून अनेक मंदिरात त्याचा दगडी पुतळाही दिसतो तो फोटो सोबत देत आहे.
सामान्य लोकांच्या मनातला हा साडेतीन घटकांचा राजा व त्याच्याबद्दलची कृतज्ञता हे त्या पुतळ्याचे प्रतीक होते. त्याला मिळालेल्या साडेतीन घटकांत त्याने रयतेच्या कल्याणाचे निर्णय घेतले आणि आत्ता पाच-पाच वर्षे सत्ता मिळूनही जनतेचे प्रश्न सोडवता न येणारे राज्यकर्ते असे चित्र आपण पाहात आहोत. म्हणून आपण शिराळशेठ आपल्यातून जाऊ देता कामा नये अशी इच्छा!
राज्यनिर्मिती होऊन पन्नास-साठ वर्षे झाली तरीही प्रजेच्या पाणी, अन्न, वीज, निवारा ह्या महत्त्वाच्या गरजाही राज्यकर्त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत, हे आज आपण अनुभवीत आहोत.
पण इच्छा असली तर काय करता येऊ शकते ते ह्या शिराळशेटने त्याला मिळालेल्या अवघ्या साडेतीन घटिकांमधून दाखवून दिले. त्या तेवढया वेळेत त्याने तातडीने जास्तीत जास्त देवस्थानांना वर्षासनें नेमून दिली. अनेक धार्मिक स्थळांना शक्य तेवढया सोयी-सुविधांसाठी मुबलक निधी उपलब्ध करुन दिला, देणग्या दिल्या. दानधर्म केला. जे एखाद्या राजाला दहा-बारा वर्षांमध्ये जमणार नाही एवढी धर्मकृत्यें त्याने केली.
त्याच्या ह्या औदार्याचे आणि धर्मशीलतेचे स्मरण म्हणून सातारा येथील शिराळे या गावी श्रावण शुध्द पंचमीला त्याच्या नावाने उत्सव साजरा केला जातो. त्याच्या प्रतिमेची पूजा केली जाते.
'जोडोनियां धन उत्तम वेव्हारें। उत्तमचि गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीव खाणी॥' असे आपल्याला तुकोबांनी सांगितले आहेच.
तुकोबा म्हणतात, जनहो, तुम्ही अतिशय उत्तम मार्गाने कोणाला न फसविता व्यापाद उदीम करा, व्यवसाय करा. त्याद्वारे भरपूर संपत्ती कमवा, आणि नंतर ती 'इदं न मम' ह्या विचाराने योग्य कामासाठी, विधायक कार्यासाठी खर्च करा. जो अशातऱ्हेने वागेल त्याला उत्तम गति तर मिळेलच शिवाय मनःशांतीदेखील लाभेल. शेवटी आत्मिक समाधान महत्त्वाचे!
तुकोबांच्या प्रत्येक शब्दाचा नीट विचार करावयास लागलो की, मन न सांगता आपसूकच अंतर्मूख होते. धन मिळवा पण कसे, तर सनदशीर मार्गाने मिळवा. चांगला उद्योग करुन मिळवा. लोकांना व्यसनी बनविणाऱ्या वस्तुंची निर्मिती करुन त्यांना, त्यांच्या नातलगांना आणि परिणामी साऱ्या समाजाला दुःखाच्या खाईत लोटून बख्खळ पैसा कमविला तरी त्याचा काय उपयोग?
दुधात पाणी घालून पाण्यासारखा पैसा मिळवायचा आणि तो तसाच उधळायचा ह्याला काय अर्थ आहे? एखाद्याला अडचणीत टाकून मग त्याच्याकडे लाच मागाल आणि समाजात उजळ माथ्याने फिरता यावे म्हणून गाजावाजा करुन दान कराल तरी ते 'पुण्य' म्हणून गणले जाणार नाही. नेकीने, श्रमाने पैसे कमवा, ते थोडे-थोडे करुन जमा करा आणि नंतर योग्य ठिकाणी 'सत्कारणी' लागतील अशातऱ्हेने त्याचा विनियोग करा. 'क्षणशः कणशश्चैव विद्या अर्थंच साधयेत्' असे पूर्वी लहानपणी मुलांना शिकविले जाई. क्षण-क्षण करुन प्रत्येक क्षण सत्कारणी लावून विद्या मिळवा आणि कण-कण करुन अर्थ म्हणजे धन जोडा. 'थेंबे थेंबे तळे साचे'- हा दाखलादेखील हेच सांगण्यासाठी दिला जाई.
आता पैसा खूपच मोठा झाला आहे. पण तो तसा मोठा होतांना खोटादेखील झाला आहे. काहीही न करता, दुसऱ्याला 'टोपी घालून किंवा 'शेंडी' लावून आपले खिसे कसे भरुन घ्यायचे ह्याच विचारात अनेकजण असतात. पैसा, आणखी पैसा, अधिक पैसा, सायकल, स्कूटर, गाडी अशा आपल्या इच्छा-आकांक्षा सतत अधिकाधिक हाव धरतांना दिसतात.
'मी-माझे'ह्यापलिकडील जगाची पर्वा करण्याची आजच्या पिढीला गरजच वाटेनाशी झाली आहे. ज्याच्याकडून 'लाभ' आहे त्याच्यावर 'लोभ' करावा एवढेच त्यांचे ब्रीद आहे की काय असे वाटते. त्याचा परिणाम म्हणजे मऊ गाद्यागिरद्या, एअरकंडिशनर असूनही मनःशांती मात्र तसूभरही लाभत नाही. जीव तळमळ तळमळ करीत राहातो.उद्याची-परवाची काळजी वाटत राहाते. झोपेची गोळी घेऊनही झोप लागत नाही.
तुम्ही परोपकाराची चव एकदा तरी चाखून बघा. दुसऱ्याला देण्यातील आनंद काय असतो ते एकदा तरी अनुभवा. मग ही जीवाची तगमग कधी अदृश्य झाली ते तुम्हाला कळणारदेखील नाही. त्यासाठी एक दिवस तरी प्रत्येकानें शिराळशेट बनावें!
संदर्भ
: कै. वा. गो. आपटे यांचा शब्दकोश, महाराष्ट्र शब्दकोश व प्रल्हाद कृष्ण
प्रभुदेसाई यांचा ‘आदिशक्तीचे विश्वरूप अर्थात देविकोश खंड-१ (वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध).
















No comments:
Post a Comment