Tuesday, November 28, 2023

किल्ले बेगमपुर, माचणूर किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर

सिध्देश्वर मंदिर :- 

               मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्‍या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. सोलापुरपासून ४० किलोमीटर व मंगळवेढ़यापासून १४ किलोमीटर अंतरावर माचणुर तीर्थक्षेत्र आहे.बहु वैभवकुंड पंढरपुर येथील विट्ठलाच्या पदस्पर्शाने पावन होवुन माचणुर दिशेला प्रवाहीत होणारी भीमा नदी वाहत आहे. या नदीला येथे चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. चंद्रभागा नदीच्या मध्यावर भूगर्भ रेषेवर माचणुर हे गांव आहे. याच गावाला नाथाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे प्राचीनकाली ऋषिमुनी तपस्येला बसत असत.नदीच्या पात्रात सुंदर देखने जटाशंकर मंदिर आहे.तरी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस ह.भ.प.बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे. 
 

            माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर हेमाडपंती असून त्याला चार बाजूने कोट चढविला आहे.




 

 

. या शिवाय नदीकडे उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांचा घाट बांधला आहे.. या पायऱ्या उतरलं कि आपण.. बेटासारख्या दिसणाऱ्या शिवमंदिराच्या पुढ्यात येवून पोहोचतो..
 
 या घाटाच्या कठड्याकडे नीट पाहिल्यास त्यावर व्याघ्र प्रतिमा कोरल्याचे दिसून येते.दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते.
        माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात १६९४ ते १७०१ पर्यंत मुक्काम होता. त्‍या काळात त्‍याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्‍या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. त्‍या ऐतिहासिक घटनेबद्दलच्‍या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्‍यानंतर नैवेद्याच्‍या ताटावरील कापड दूर सारताच गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसल्याचा उल्‍लेख आहे. मांसाचा नूर पालटला म्हणून ‘मासनूर’चे नंतर अपभ्रंशाने माचणूर झाले.
 
 

 

 
      माचणूर गावात जाणा-या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते. रस्ता संपतो तेथे औरंगजेबाचा किल्ला आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत.डाव्‍या हाताला शंकराचे लहान मंदिर आहे.
 
 

 
 पाय-या उतरून पुढे गेल्यानंतर दुसरे प्रवेशद्वार लागते.  पुढे प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. 
 
 

 
 

 
 या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत.
 
 
 
 

 
 
 
  मंदिरात ३ फूटी नंदी आहे.  सिद्धेश्वर मंदिरातील नंदी हा देखील बघण्यासारखा आहे. शंकराकडे तिरपी नजर टाकणारा पितळेची शिंगे असलेला हा नंदी खासंच आहे.









शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.भव्य असे नदी पात्रामधे जटाशंकराचे मंदिर आहे.

 

 
 
 
    गाभाऱ्यात सिद्धेश्वराची (शंकराची) पिंडी आहे. चांदीचा भव्य मुखवटाही आहे. तेथे जाण्‍यासाठी दोन दरवाजे ओलांडून जावे लागते. त्‍यापैकी पहिला दरवाजा पाच फूट उंचीचा तर दुसरा अडीच फूट उंचीचा आहे. त्या दरवाजातून वाकून पुढे गेल्‍यानंतर गाभा-यात प्रवेश करता येतो. 

 मंदिराबाहेर जुने, मोठे पिंपळाचे झाड आहे. महाशिवरात्रीला तेथे यात्रा भरते. मोठा उत्सव साजरा केला जातो. दीड-एक लाख भाविक येतात. पंढरपूरचे बडवे श्रावणात ठराविक काळासाठी माचणूरच्‍या मंदिरात येऊन पूजा करतात. उजव्या बाजूस, मंदिराच्या तटाला लागून पन्नास पायऱ्या खाली उतरल्यावर भीमानदीच्या किनारी बांधलेला प्रशस्‍त घाट नजरेत भरतो. नदी पात्रातच मध्यभागी जटाशंकराचे छोटे मंदिर आहे, तेथे बोटीने जाता येते. नदीच्‍या दुस-या तीराला मल्लिकार्जुन मंदिर आहे. भीमानदीला १९५६ साली आलेल्या पूराने मंदिराचा कळस वाहून गेला. पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले. पूर प्रचंड होता, पन्नास पायऱ्या चढून पाणी सिद्धेश्वराच्या मंदिरात सहा फूट उंचीपर्यंत आले होते. त्याची खूण गावकरी दाखवतात.
मंदिराची पूजा ब्रम्हपुरीतील गुरव आळीपाळीने करतात. ब्रम्हपुरीत त्यांच्या चाळीस-पन्नास घरांची वाडीच आहे. सर्वांचे आडनाव पुजारी आहे. सर्वजण शाकाहारी आहेत. देवस्थानाला इनाम म्हणून मिळालेली जमीन बावन्न एकर होती. उजनी धरणात त्यापैकी बावीस एकर गेली व आता ती तीस एकर जमीन आहे. माचणूर गावाच्‍या पूर्व दिशेस एक मैल अंतरावर भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव आहे. तेथे औरंगजेबाच्‍या मुलीची कबर आहे.
     माचणूर हे गाव सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर आहे. सोलापूरला रेल्‍वे किंवा बसने पोचता येते. तेथून एस.टी. ने त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून माचणूरला जाता येते. पंढरपूरला रेल्‍वेने पोचण्‍याची सोय आहे. तेथून एस.टी. पकडली तर एकवीस किलोमीटर अंतरावर माचणूर गाव लागते. ते गाव मंगळवेढ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. गावात जाणार्‍या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.

माचणूरचा किल्ला :-

        सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.
  किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे याउतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला. मंगळवेढा ते माचणूर अंतर १३ ते १४ किमी आहे. माचणूर फाट्यावरून चालत  किल्ल्यात पोहचायला १० ते १५ मिनटं लागतात.

 माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर ! 
औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. 
गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते.
 
 

      रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत.आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत.



 बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २० - २५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत.
 



 




 
प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.

माचणूर जवळच ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथील नदी काठ स्थळावर राजमाता जिजाऊंच्या माहेरचा वारसा असलेले राजे जयजगदेवराव यांचे समाधीस्थळ.

माचणूरपासून 14 किलोमीटर अंतरावर भीमा नदी पात्रातील निसर्गाच्या सान्निध्यात बालगणेश म्हणून प्रसिद्ध असलेले सिद्धापूर येथील मातुर्लिंग मंदिर

 https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/let-us-know-about-brahmapuri-historical-place-solapur-district

जाणून घ्या ऐतिहासिक स्थळ ब्रह्मपुरीबाबत ! राजे लखुजीराजे जाधवरावांचे पणतू यांचे समाधीस्थळ व मुघलकालीन राजधानी

दावल इनामदार

ब्रह्मपुरी (सोलापूर) : सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूरपासून 40 किलोमीटर व मंगळवेढापासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी, माचणूर (ता. मंगळवेढा) येथील गावास पौराणिक, ऐतिहासिक आणि धार्मिक अशा तिन्ही दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. या गावातच मुघलकालीन सत्ता चालत होती. 

येथून वाहत असलेल्या नदी पात्रालगतच औरंगजेब बादशहाचा नदी पात्रातील कडेकपारीतील इ. स. 1695 च्या आसपासचा भुईकोट किल्ला आहे. येथूनच ते न्यायदान करत असत. भीमा नदीच्या पात्रात बाजूस सुंदर असे प्राचीन हेमाडपंती सिद्धेश्वराचे मंदिर आहे तसेच भीमा नदी पात्रातील कडेकपारीपासून जवळच ब्रह्मपुरी हे गाव असून, या गावास ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे. मुघलांची सत्ता कित्येक वर्षे या गावापासून चालत होती. ब्रह्मपुरी परिसरातील गावात मुघलांच्या मोठ्या प्रमाणात छावण्या होत्या. औरंगजेब बादशहाने पाच ते सहा वर्षे या कालावधीत दिल्लीचा कारभार येथून चालवली होती. 

भीमा नदी पात्राजवळ असणाऱ्या स्थळावर श्रीमंत राजेलखुजीराव राजेजाधवराव यांचे पणतू श्रीमंत रावजगदेवराव राजेजाधव यांचे समाधीस्थळ आहे. तसेच माचणूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे अधिक महत्त्व आहे. आजूबाजूच्या परिसरात अधिक माहिती प्राप्त असून इतिहासकालीन स्थळं आहेत. माचणूर या गावाला नाथाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे प्राचीनकाली ऋषीमुनी तपश्‍चर्येला बसत असत. पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी नदी कडेच्या बाजूला भव्य असा घाट बांधला आहे. नदीपात्रात सुंदर असे भव्य देखणे जटाशंकर मंदिर आहे. या स्थळी शंकराचार्य, स्वामी समर्थ, सीताराम महाराज, बाबा महाराज आर्वीकर आदी संत येथे येऊन गेले आहेत. सिद्धेश्वर मंदिराच्या पूजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचणूर येथील मुस्लिम समाजाकडे आहे. पूजाअर्चा करण्याचा मान ब्रह्मपुरीतील गुरव समाजाकडे असून प्रत्येक बुधवारी आठवडा पाळीप्रमाणे आजतागायत बदलला जातो. 

माचणूर गडाच्या प्रवेशद्वारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशद्वारासमोर भिंत व दोन बुरूज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशद्वार तटबंदी व बुरूज अजून शाबूत आहेत. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशद्वाराच्या विरुद्ध टोकाला मशीद आहे. मशिदीसमोर दगडात बांधलेला पाण्याचा टाक आहे. मशिदीच्या मागील बाजूस खोल व भीमा नदीच्या कडेकपारीत पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पुरामुळे नष्ट झालेली आहे. त्यामुळे पर्यटनास चांगली संधी उपलब्ध झाली असून, प्रशासनाने विकसित करून वारसा जतन केला पाहिजे. 

स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव हे राजमाता जिजाबाईंचे वडील आणि छत्रपती शिवरायांचे आजोबा एवढीच त्यांची ओळख आज जनसामान्यांना असली, तरी 
श्रीमंत राजेरावजगदेवराव दत्ताजीराव जाधवराव हे श्रीमंत राजेलखुजीराव विठ्ठोजीराव जाधवराव यांचे पणतू व देऊळगाव राजा प्रसिद्ध शाखा म्हणून गाजली. राजे रावजगदेवराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे तृतीय पुत्र बहादूरजी यांचे नातू होत. राजे बहादूरजी यांना पुत्र नव्हता म्हणून त्यांनी त्यांचे बंधू राजे राघोजी यांचे पुत्र राजे दत्ताजीराव यांना दत्तक घेतले होते. राजे दत्ताजीराव आणि माता सगुणाबाईसाहेब यांचे पुत्र रावजगदेवराव होत. पिता राजे दत्ताजीराव यांचा 10 नोव्हेंबर 1665 रोजी गुलबर्गा युद्धात मृत्यू झाल्यानंतर त्यांना वतन प्राप्ती झाली, तेव्हा त्यांचे वय अवघे 14 वर्षे होते. जाधवरावांचे वतन सर्व शाखांमध्ये एकत्रित होते; परंतु राजे दत्ताजीराव यांच्या मृत्यूनंतर सिंदखेडकर जाधवराव बंधूमंडल शाखांनी म्हणजे बंधूमंडलांनी वतनातून राजीनामे दिले म्हणून रावजगदेवरावास एकट्यासच वतनप्राप्ती झाली. 

कारकिर्दिच्या सुरवातीसच त्यांनी वाघीनगिरीचा किल्ला घेऊन आपला पराक्रम गाजवला. रावजगदेवरावांना सप्तहजारी मनसब व जहागिरी दिलेली होती. रावजगदेवराव हे स्थापत्य व कलाकौशल्याचे आवड असलेले होते. रावजगदेवराव हे खूप धार्मिक होते. त्यांची दिनचर्या ही शहाजी महाराजसाहेबांसारखीच दिसून येते. 

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिराचे बांधकाम हे राजे रावजगदेवराव यांनी इ. स. 1692 साली बांधून घेतले. आजही त्यांच्या वंशजांनाच फक्त मंदिराच्या गाभाऱ्यात विवाह लावण्याची परवानगी आहे आणि ती पिढ्यान्‌पिढ्या चालत आली आहे. राजे रावजगदेवराव यांचा मृत्यू 19 सप्टेंबर 1700 रोजी ब्रह्मपुरी येथील भीमा नदी काठाजवळच तळावर झाला. त्यांची समाधी ब्रह्मपुरी येथे आहे. 

ब्रह्मपुरी गावात औरंगजेबाची राजधानी होती. त्यावेळेस अनेक मराठा सरदार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील व्यक्ती येथे कैद होत्या. तसेच ब्रिटिशकालीन या गावात काही जणांना इनामी जमीन मिळाल्या. राजे जाधवराव यांचे भव्य स्मारक व्हावे. पर्यटनास संधी असून प्रशासनाने पाठपुरावा करावा. 
- आनंद पाटील, 
ब्रह्मपुरी 

ब्रह्मपुरी गाव हे भोसले-जाधवराव यांचे वंशज असून, मराठ्यांची काशी आहे. तेथील स्मारकास उजाळा दिल्यास गावं प्रसिद्धीच्या जोखात येतील. त्यामुळे पर्यटनास संधी मिळेल. 
- गोपाळराव देशमुख, 
इतिहास अभ्यासक, पंढरपूर 

ब्रह्मपुरी गावास ऐतिहासिक मोठे महत्त्व असून राजमाता जिजाऊमाता यांचे भाऊ बहादूरजीराजे यांचे नातू राजे जयजगदेवराव जाधव यांचे समाधीस्थळ आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रशासनाने निधी देऊन प्रयत्न करावा. 
- राजन पाटील, 
संचालक, दामाजी शुगर 

ब्रह्मपुरी, माचणूर या गावात अनेक ऐतिहासिक स्थळे असून राजे जयजगदेवराव यांचे समाधीस्थळ, मुघलकालीन किल्ला, प्राचीन हेमाडपंथी श्री सिद्धेश्वराचे मंदिर आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्र म्हणून प्रशासनाने विकसित करून ऐतिहासिक वास्तू जतन केल्या पाहिजे. 
- जनार्दन शिवशरण, 
उद्योजक, माचणूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

 

ब्रम्हपुरीचे मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्व - 

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान नंतर रायगड पाडावनंतर औरंगजेब यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी सकवारबाई सरकार, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी व हिदंवी स्वराज्याची राजलक्ष्मी महाराणी येसुबाईसाहेब सरकार, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुत्र व मराठे साम्राज्य चे संस्थापक थोरले शाहू महाराजांनी मोगलांना या तळावर राजकैदी म्हणून ठेवले...
सरसेनापती संताजीराव घोरपडे याचा शीर या ठिकाणांवर औरंगजेब यास नजारा करण्यात आले त्याअर्थी संताजीराव घोरपडे याच्या रक्ताचे शेवटचा थांब या ठिकाणांवर पडले...
या ठिकाणांवर एका म्हणे तयार झाले मोगलांला सैन्यात " पाण्यात संताजी धनाजी दिसतात काय " ........
!!नशीबवा औरंगजेब हिन्दू सैनिक व जनतावरील जिझिया कर रद्द केला नाहीतर त्याचा समधी राजे रावजगदेवराव जाधवराव यांना बांधले !!असते
१) राजे रावजगदेवराव हे राजे लखुजीराव जाधवराव यांचे तृतिय पुत्र बहादुरजी यांचे नातु होत. यांची शाखा देऊलगावराजा शाखा म्हणुन प्रसिद्ध पावली. राजे बहादुरजी हे सुरुवातीस राजे लखुजीराव यांचे बंधु भुतजी /जगदेवराव याना दत्तक गेलेले होते,परंतु ते इ सन १६२९ मध्ये लखुजीराव यांच्या हत्येनंतर वतन प्राप्तीसाठी मुलवतनाला आलेले होते आणी पुढे यांचीच शाखा देऊलगावराजाची प्रसिद्ध शाखा म्हणुन प्रसिद्ध पावली.राजे बहादुरजी याना पुत्र नव्हता म्हणुन त्यानी त्यांचे बंधु राजे राघोजी यांचे पुत्र राजे दत्ताजीराव हे दत्तक घेतले होते. याच राजे दत्ताजीराव यांचे पुत्र रावजगदेवराव होत.
२) पिता...राजे दत्ताजीराव बीन राजे बहादुरजी
३) बंधु..... राघोजीराजे व यशवंतराव.
४) माता.... सगुणाबाईसाहेब
५) पुत्र...... मानसिंग,राघोजीराव,यशवंतराव,दत्ताजीराव आणी तुलजाजीराव
६) पत्नि...दुर्गाऊ,सुलाऊ व तुलजाऊ
७) पिता राजे दत्ताजीराव यांचा १० नोव्हेंबर १६६५ रोजी गुलबर्गा युद्धात मृत्यु झाल्यानंतर त्याना वतन प्राप्ती झाली तेव्हा त्यांचे वय अवघे १४ वर्षे होते. जाधवराव वतन सर्व शाखा मध्ये एकत्रीत होते परंतु राजे दत्ताजीराव यांच्या मृत्युनंतर सिंदखेडकर जाधवराव बंधुमंडल शाखानी म्हणजे आडगावकर,उमरदकर,किनगावकर,जवलखेडकर व मेहुणेकर बंधुमंडलानी वतनातुन राजीनामे दिले म्हणुन रावजगदेवरावास एकट्यासच वतनप्राप्ती झाली.
८) कारकिर्दितीच्या सुरुवातीसच त्यानी वाघीनगिरीचा किल्ला घेऊन आपला पराक्रम गाजवला.रावजगदेवराव यांच्या सोबत या मोहिमेत त्यांचे मानकरी भानवशे,धारराव,झुंझारराव,रणनवरे,देवरे,निकम,वाघ,चौरे,भोसले,पवार,मानेराव,घाटे,मोरे आदी सरदार होते.
९) रावजगदेवरावाना सप्तहजारी मनसब व जहागिर दिलेली होती.
१०) बादशहाने जेव्हा हिंदु जनतेवर जिझिया कर लावला व हिंदुना मुस्लिम बनवण्याचे चालु केले,त्यासमयी रावजगदेवराव व जयपुरचे राजे जयसिंगराव यानी एकत्रीत येऊन तमाम दक्षिणी मराठा मंडल नाईक निंबालकर,राजे घोरपडे,मोहिते,मानेराव,घाटगे,झुंझारराव मंडलास एकत्रीत आणुन बादशहाच्या सैन्यासोबत युद्धाची तयारी केली.बादशहाने गर्द होण्याचा समय समजुन समेट घडवुन आणला व कर माफी केली व हिंदु सरदारांचे धर्मांतर बंद केले. त्यासमयी या जगदेवरावाना रावजगदेवराव राजे जाधवराव आणी जयसिंगराजे याना सवाई जयसिंग असे किताब दिले.
११) रावजगदेवराव हे स्थापत्य व कलाकौशल्याचे आवड असलेले होते.म्हणुनचयांच्या कारकिर्दित खजाना विहीर,बालसमुद्र,गंगासागर,रघुवन,कुंजबन,गाढवदरा,रायेबारेवर आदि बारवा बनवल्या. सिंदखेडराजा येथे किल्ला बांधण्यासाठी कालाकोट चे बांधकाम चालु केले,परंतु बादशहाने 'मराटे आधीच तरवार बहाद्दर जबरदस्त,त्यास किला जालियावर पातशहाशी बदलतील अशी कलपणा घेऊन मना केला.' आजही तो कालाकोट व त्यातील पाणी नहर पहावयास मिलतो.जहागिरीचा कारभार देखिल खुप चोख ठेवला होता.
रावजगदेवराव हे खुप धार्मिक होते.यांची दिनचर्या ही शहाजी महाराजसाहेबासारखीच दिसुन येते. नित्यक्रम..... दो घटिका रात्री राजे जाधवराव याणी उठुन,गुरलाकरुन एक घटिका भगवतस्मरण,निर्गुण ध्यान करुन उपरांतिक पांडवगीतेचे नामस्मरण शंभर श्लोक म्हणोन ,स्नान संध्या करून देवपुजा कुलस्वामिनी देवी मातापुर व तुलजापुर व मार्तंड सातारे व जेजुरी याजला बेलफुल ,कुंकु,भंडारा वहावा. आणी बालकृषणाचे व व्यंकटेश मुर्तीस व महादेव स्फटिक लिंग थोर याजला फुल वहावे.
देऊलगाव राजा येथील बालाजी मंदिराचे बांधकाम हे राजे रावजगदेवराव यानी इ सन १६९२ साली बांधुन घेतले
१२) मृत्यु..... राजे रावजगदेवराव यांचा मृत्यु १९संप्टेबंर१७०० रोजी ब्रम्हपुरी तळावर झाला टिप=औरंगजेब साेलापुरच्याभईकाेट किल्लात दीडवर्ष, म्हणेज राजेरावजगदेव राव पण साेलापुरच्या किल्ला व परिसरात येऊन गेले
।। सरसेनापती संताजीराव घोरपडे याच्या रक्त तील शेवटची थेंब मुळे पवन झालेल्या ब्रम्हपुरी।।
।।येथे स्वराज्याची छत्रपती राजाराम महाराज यांचा पुत्र व तंजावर कर दूसरे छत्रपती शहाजी महाराज यांच्या पुत्राच्या बलिदानाने पवित्र झालेल्या भूमीत।।
।।जितीकर राजे भोसले यांच्या पुत्राच्या बलिदानाने वीरमरण आले त्या ब्रम्हपुरी।।
।।सरसेनापती संताजीराव घोरपडे व सरसेनापती धनाजीराव जाधवराव याचा अचंबित करणारा पराक्रम मुळे साडेचार वर्ष या ब्रम्हपुरी तळावर एखाद्या कैदीप्रमाणेअडकून पडलेल्या औरंगजेब
।।येथे झालेल्या घटनात्मक इतिहासातील मराठ्यांची स्वाभिमान,निष्ठा, शौर्य व त्याग याचा मान्यवर इतिहासकारची विचार।।
छत्रपती संभाजीराजे पुत्र शिवाजी ऊर्फ शाहू महाराजांच्या साठी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे पुत्र खंडेरावव जगजीवन धर्मांतर ,,,, छत्रपती घराण्यासाठी गुजर घराण्यातील त्याग हे इथेच झाले सलाम करण्यासाठी या गुजरच्या त्याग ली।।
सरसेनापती संभाजीराव घोरपडे व सरसेनापती धनाजीराव जाधवराव याचा पराक्रम मुळे येथेच एक वाक्य तयार झाले "मुघलांच्या घोडाना पण पाणी पिताना संताजी धनाजी दिसतात हेपराक्रम चा शौर्याची गाथा

  बेगमपुर  भुईकोट :-

    सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला. माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. 


माचणूरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर नदी पात्रापलीकडे असलेले बेगमपूर (ता. मोहोळ) येथील हाफिजा बेगमबी मासाहेब( रह.) यांचा दर्गाह.


































बेगमपूर दर्गा/ मस्जिद
बेगमपूर दर्गा/ मस्जिद
बेगमपूर दर्गा/ मस्जिद
बेगमपूर दर्गा/ मस्जिद
बेगमपूर दर्गा/ मस्जिद
बेगमपूर दर्गा/ मस्जिदच्या दरवाजा बाहेर आल्यावर समोरच हि दगडी दरवाजाची कमान दिसते आणि त्याचा आत किंवा समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. 





 
  बेगमपूरला एक दर्गाह आहे त्याला बेगाम्बी दर्गाह म्हणतात. हा दर्गाह जेव्हा आपण माचणूर किंवा मंगळवेढा कडे जातो, तेव्हा नदीच्या पुलावरून डावीकडे किल्ल्यासारखी तटबंदी असलेली मस्जिद नजरेस पडते. मचणूर वरून चालत गेलो असतो, तर  १५ मिनटं लागतात. मुख्य रस्त्यावरून दर्ग्यापर्यंत पोहचायला ५ मिनटं लागतात. दर्ग्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पुरातत्व खात्याचा राष्ट्रीय संपत्तीं असलेला फलक आहे. दर्गा आतून पाहण्यापेक्षा दर्ग्याची बाहेरील किल्ल्यासारखी तटबंदी, विशेष करून नदीच्या बाजूची तटबंदी पाहण्यासारखी आहे. तीच पूलावरून आकर्षित करते.तसेच दर्ग्याच्या बाहेर आल्यावर समोरच गावात छोटा दगडी दरवाजाची कमान दिसते आणि समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. 






 

 
 
 
 
 बेगमपुर


प्रकार : भुईकोट

जिल्हा : सोलापुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला. माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. 

 गमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर भुईकोट किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज दुमजली असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २०-२५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.

© Suresh Nimbalkar

  माचणूर (Machnur)     किल्ल्याची ऊंची :  0

किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले     डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर     श्रेणी : सोपी
सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्‍या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे.












 

इतिहास :
दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.

या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास - नूर असे म्हटले जाऊ लागले.पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
पहाण्याची ठिकाणे :
माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे.

सिध्देश्वर मंदिर :- माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्‍या उतरून दुसर्‍या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्‍या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्‍यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
माचणूर गाव सोलापूर - पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून २१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्‍या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय स्वत: करावी.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय नाही.

 

१९संप्टेबर
⛳⛳राजे जगदेवराव जाधवराव
याच्या स्मृतिदिनी निमित्ताने विन्रम अभिवादन
ब्रम्हपुरी, तालुका मगंळवेढा, जिल्हा सोलापूर ⛳⛳
आपले।
🙏🙏राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर व छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे स्मृतिदिनी अभिवादन..... 🙏🙏
मा. श्री. मनोजभाऊ शिंदे (छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक)
औरंगजेब यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान नंतर ज्या ब्रम्हपुरीत पाच वर्षे २लाख सैन्याचे गराड्यात एखाद्या कैदीसारखे रहावे लागले तो ब्रम्हपुरी होय
सरसेनापती संताजीराव घोरपडे व सरसेनापती धनाजीराव जाधवराऊ याचा नेतृत्व खाली मराठे वीर दौडले, या दोन्ही कुशल सेनानायकाचे प्रत्येक योजना पुढे औरंगजेबाने पराभूत व्हावे व याचा परिसरात दोन भुईकोट किल्ला औरंगजेब यांना बांधले एका मचुणरचे दुसरे घोडेश्वर भुईकोट किल्ला, याचा इतिहास ऐकण्यासाठी अवश्य या.....

कृपया हे पाेस्ट शेयर करावे सर्व ने विनम्र विनंती
आपले
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक मनोजभाऊ शिंदे व पदाधिकारी
"
संपर्क प्रमुख
संतोष झिपरे ९०४९७६०८८८
फोटो मागील वर्षात स्मृती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर च्या आयोजित कार्यक्रमातील आहे यांचा नोंदी घ्या


अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज जेव्हा मंगळवेढा व आसपासच्या परिसरात वावरत असत, त्याकाळी त्यांचे वास्तव्य जेथे काही काळ झाले होते असे मंगळवेढ्याजवळील श्रीक्षेत्र माचणूर! भगवान श्रीसिद्धेश्वर महादेवाचे भव्य मंदिर याठिकाणी आहे त्याची काही छायाचित्रे.
मंदिराची रचना अत्यंत वैशिष्ट्य पूर्ण अशी आहे
1)यामध्ये तिरका बसलेला व मंदिरात डोकावत असणारा नंदी आहे.
2)नंदीच्या छातीखाली नाग व पिंड आहे.
3)बाजूला हरीण व वाघ यांचे दगडात कोरीव चित्र आहे जे नक्कीच विशिष्ठ घटना खुणावत आहे.
4) नंदी साठी जो दगड वापरला आहे त्याचा जर का आपण हाताने थाप मारली तर जसा आपण एखाद्या भांड्यावर हात मारल्यावर आवाज येतो तसा मेटल साऊंड येतो .
5) मंदिराच्या शिखराच्या भागावर सदर शिवलिंगाची उत्पत्ती एका पारिजातकाच्या झाडातून कशी झाली हे दर्शविले आहे.
6)तसेच बहुतांश सभामंडपातील खांबावर नाग विविध स्थितीत कोरला आहे.
7)अत्यंत शांत व भव्य असे हे मंदिर भिमापात्रात वसलेले आहे.
नक्की भेट द्या !


किल्ले माचणूर..
ता.मंगळवेढा जि.सोलापूर
किल्ले मंचूरच्या परिसरातील सिद्धेश्वराचे मंदिर आणि औरंगजेबाची फजिती प्रचलित दंतकथा . . .
मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात १६९५ ते १७०१ पर्यंत मुक्काम होता. त्या काळात त्याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. त्या ऐतिहासिक घटनेबद्दलच्या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्यानंतर नैवेद्याच्या ताटावरील कापड दूर सारताच गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसल्याचा उल्लेख आहे. मांसाचा नूर पालटला म्हणून ‘मासनूर’चे नंतर अपभ्रंशाने माचणूर झाले.
माचणूर किल्ला
दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.
माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे.
माहिती संभार. राजा पटवर्धन




सोलापुर जिल्ह्यातील माचणुर येथील सिद्धेश्वर मंदिर 📸❤️
माचणुर (ता. मंगळवेढा) येथे भीमा नदीकाठावर कडेकपारीत प्राचीनकाली हेमाडपंती भव्य असे देखने श्री सिद्धेश्वराचे मंदिर असून, श्रावण मासानिमित्त येथे महिनाभर भाविकांची वर्दळ सुरु असते. सोलापुरपासून ४०किलोमीटर व मंगळवेढ़यापासून १४ किलोमीटर अंतरावर माचणुर तीर्थक्षेत्र आहे.बहु वैभवकुंड पंढरपुर येथील विट्ठलाच्या पदस्पर्शाने पावन होवुन माचणुर दिशेला प्रवाहीत होणारी भीमा नदी वाहत आहे. या नदीला येथे चंद्रभागा म्हणून ओळखले जाते. चंद्रभागा नदीच्या मध्यावर भूगर्भ रेषेवर माचणुर हे गांव आहे. याच गावाला नाथाचे ठाणे म्हणून ओळखले जाते. येथे प्राचीनकाली ऋषिमुनी तपस्येला बसत असत.नदीच्या पात्रात सुंदर देखने जटाशंकर मंदिर आहे.तरी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस ह.भ.प.बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.
सिध्देश्वर मंदिर :- माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.भव्य असे नदी पात्रामधे जटाशंकराचे मंदिर आहे.
( वरील माहिती ही विकिपीडिया व इतर काही आर्टिकल्स मधून घेतली आहे , तरी त्यात बदल असल्यास सुचवावे ही विनंती )



माचनूर किल्ला

   मंगळवेढा किल्ला आणि त्यात अचानक, अनपेक्षित घडलेलं पक्षी निरीक्षण (Bird Warching) उरकून माचनूर कडे निघालो.. मंगळवेढा ते माचनूर असा १०-१२ कि.मी. चा प्रवास उरकून सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील रस्त्याने पुढे निघालो.. माचनूर च्या किल्ल्या जवळील गावात लाजवंती पार्क केली आणि तडक किल्ल्याकडे निघालो.. हागणदारी तून वाट काढत.. किल्ल्याच्या मुख्य द्वाराशी येवून पोहोचलो.. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा एक आडवी भिंत घालून लपवलेला आहे.. तटबंदी फारशी उंच नाही जेमतेम १५-२० फुट पण अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत प्रवेश केला.. आणि पहिले तर क्रिकेटचे मैदान.. गावकऱ्यांनी किल्ल्यात एक अवशेष शिल्लक ठेवला नाही.. नुसते वाड्याचे चौथरे नजरेस पडतात..

जेंव्हा औरंगजेबाने आदिलशाही नेस्तनाबूत करण्याची मोहीम उघडली त्यावेळी या किल्ल्यावर मुक्काम केल्याचे इतिहासकार सांगतात.. दरवाजातून समोर पहिले असता चंद्रभागा नदीचे दर्शन होते तिकडे डाव्या कोपरयात.. एक पांढऱ्या रंगाने रंगवलेली एक मंदिरासारखी वास्तू नजरेस पडते.. तिकडे निघालो.. या वास्तूच्या मागच्या बाजूस भीमा नदी वाहते आणि डावीकडे सिद्धेश्वर मंदिराचा घाट आणि पाण्यात एखाद्या बेटासारखे दिसणारे शिवमंदिर नजरेस पडते.. माचनूर किल्ल्याला दोन बाजुनी नदीच्या पात्राने वेढले आहे.. भीमा नदी या किल्ल्याला वळसा मारूनच पुढे जाते.. दोन बाजूंना नैसर्गिक संरक्षण असल्याने या किल्ल्याचे स्थान भौगोलिक दृष्ट्या उत्तम आहे..  किल्ल्याची नदीकाठची तटबंदी पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आहे.. किल्ल्याचा पसारा तसा बऱ्यापैकी मोठा आहे.. पण ‘बाहेरून चकचकाट आणि आत भुइसपाट’ अशी अवस्था आज या किल्ल्याची झाली आहे..

इथे पोहोचलो तो आभाळ झाकोळलं होतं.. आणि नदीचा परसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेलं होता.. इथे सिंघम ला पाण्याला समांतर उडणाऱ्या काही टिटव्या, बाभळीच्या झाडावर बसलेला खंड्या.. देसी हमिंग बर्ड चे दर्शन झाले.. तिकडे खाली एका खोपाड्यात.. काहीतरी जाताना दिसलं.. पण ते उदमांजर होतं का घोरपड की मुंगुस यावर कुणाचंच एकमत झालं नाही .. शेवटी काहीतरी दिसलं असं डिक्लेअर करून पुन्हा मुख्य दरवाजाशी येवून पोहोचलो.. दरवाजासमोर जंगी फोटोसेशन उरकून सिद्धेश्वर मंदिराकडे निघालो..

माचनूरचे सिद्धेश्वर मंदिर आणि बेगमपूर दर्गा
माचनूर चे सिद्धेश्वर मंदिर हेमाडपंती असून त्याला चार बाजूने कोट चढविला आहे.. या शिवाय नदीकडे उतरण्यासाठी दगडी पायऱ्यांचा घाट बांधला आहे.. या पायऱ्या उतरलं कि आपण.. बेटासारख्या दिसणाऱ्या शिवमंदिराच्या पुढ्यात येवून पोहोचतो.. या घाटाच्या कठड्याकडे निट पाहिल्यास त्यावर व्याघ्र प्रतिमा कोरल्याचे दिसून येते.. सिद्धेश्वर मंदिरातील नंदी हा देखील बघण्यासारखा आहे.. शंकराकडे तिरपी नजर टाकणारा पितळेची शिंगे असलेला हा नंदी खासंच आहे.. सिद्धेश्वराचे दर्शन घेवून सोलापूरकडे निघालो.. इथून जवळच बेगमपूर चा दर्गा आहे.. बेगमपूर इथे नदी काठी औरंगजेबाच्या एका मुलीचे थडगे आहे.. यावर बरेच कोरीव काम केल्याचे दिसते..  पुरातत्व खात्याने सध्या इथली इमारत संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे.

सोलापूरच्‍या मंगळवेढा तालुक्‍यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्‍ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात तेथे राहत असे. किल्‍ला व तेथील बुरुज काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. किल्ल्याचा परिसर मोठा असून आतमध्ये रान माजले आहे. तेथे वस्ती नाही. जवळूनच भीमा नदी वाहते.
किल्ल्यातच एक पडकी मशीद आहे व बाजूला एक कबर दिसते. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे लोक म्हणतात, पण नक्की माहिती कोणालाच नसल्याने ती कबर कोणाची हा प्रश्न पडतो. सोलापूरचे शासकीय पुरातत्त्व खाते तेथील कारभार पाहते.
मंगळवेढा गावापासून जवळ ब्रम्हपुरी गावाजवळ माचणूर येथे भिमा नदीच्‍या काठावर सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. मंदिर दगडी असून भव्य आहे. मोठ्या शिळांचा वापर बांधकामासाठी केला आहे. दगडी पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या आत उभे राहिलो तर मंदिराचा परिसर व उजव्या बाजूला भीमा नदी असे सुंदर दृश्य दिसते. माचणूरचे मंदिर प्राचीन आहे. ते केव्हा बांधले गेले याचा उल्लेख नाही. पण औरंगजेबाच्या आधीच्या काळात ते नक्की अस्तित्वात होते, कारण औरंगजेबाचा मंदिराजवळच्या किल्ल्यात 1694 ते 1701 पर्यंत मुक्काम होता. त्‍या काळात त्‍याने ते मंदिर नष्ट करण्याचे प्रयत्न चालवले होते. (भीमेच्या पाण्यामध्ये हे मंदिर वाहून जाईल अशी व्यवस्था मोठा चर खोदून केली होती, पण ती यशस्वी झाली नाही.) त्याने सिद्धेश्वराला मांस अर्पण करण्याचा उद्योगही केला, पण त्‍या प्रदेशातील भुंगे वा मधमाशा यांनी त्याच्या सैन्याला सळो, की पळो करून हुसकून लावले. नंतर औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये वार्षिक वतन देत त्याची भरपाई केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. त्‍या ऐतिहासिक घटनेबद्दलच्‍या प्रचलित दंतकथेत औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवल्‍यानंतर नैवेद्याच्‍या ताटावरील कापड दूर सारताच गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसल्याचा उल्‍लेख आहे. मांसाचा नूर पालटला म्हणून ‘मासनूर’चे नंतर अपभ्रंशाने माचणूर झाले.
माचणूर गावात जाणा-या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते. रस्ता संपतो तेथे औरंगजेबाचा किल्ला आहे. सिद्धेश्‍वराचे मंदिर काळ्या पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्‍या घडणीत तुळजापूरच्‍या मंदिराशी साम्‍य जाणवते. दगडी प्रवेशद्वारातून मंदिराच्‍या प्रांगणात प्रवेश करताना दोन्‍ही अंगांना पहारेक-यांच्‍या देवड्या दिसतात. डाव्‍या हाताला शंकराचे लहान मंदिर आहे. पाय-या उतरून पुढे गेल्यानंतर दुसरे प्रवेशद्वार लागते. त्‍या द्वाराच्‍या दोन्‍ही बाजूंना भिंतीत विरगळी बसवलेल्‍या आहेत.
सिद्धेश्‍वराच्‍या मंदिराभोवती तटबंदी उभारली आहे. मंदिरासमोर तीन फूट उंचीचा भव्य नंदी आहे. गाभाऱ्यात सिद्धेश्वराची (शंकराची) पिंडी आहे. चांदीचा भव्य मुखवटाही आहे. तेथे जाण्‍यासाठी दोन दरवाजे ओलांडून जावे लागते. त्‍यापैकी पहिला दरवाजा पाच फूट उंचीचा तर दुसरा अडीच फूट उंचीचा आहे. त्या दरवाजातून वाकून पुढे गेल्‍यानंतर गाभा-यात प्रवेश करता येतो. मंदिराबाहेर जुने, मोठे पिंपळाचे झाड आहे. महाशिवरात्रीला तेथे यात्रा भरते. मोठा उत्सव साजरा केला जातो. दीड-एक लाख भाविक येतात. पंढरपूरचे बडवे श्रावणात ठराविक काळासाठी माचणूरच्‍या मंदिरात येऊन पूजा करतात. उजव्या बाजूस, मंदिराच्या तटाला लागून पन्नास पायऱ्या खाली उतरल्यावर भीमानदीच्या किनारी बांधलेला प्रशस्‍त घाट नजरेत भरतो. नदी पात्रातच मध्यभागी जटाशंकराचे छोटे मंदिर आहे, तेथे बोटीने जाता येते. नदीच्‍या दुस-या तीराला मल्लिकार्जुन मंदिर आहे. भीमानदीला 1956 साली आलेल्या पूराने मंदिराचा कळस वाहून गेला. पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले. पूर प्रचंड होता, पन्नास पायऱ्या चढून पाणी सिद्धेश्वराच्या मंदिरात सहा फूट उंचीपर्यंत आले होते. त्याची खूण गावकरी दाखवतात.
मंदिराची पूजा ब्रम्हपुरीतील गुरव आळीपाळीने करतात. ब्रम्हपुरीत त्यांच्या चाळीस-पन्नास घरांची वाडीच आहे. सर्वांचे आडनाव पुजारी आहे. सर्वजण शाकाहारी आहेत. देवस्थानाला इनाम म्हणून मिळालेली जमीन बावन्न एकर होती. उजनी धरणात त्यापैकी बावीस एकर गेली व आता ती तीस एकर जमीन आहे. माचणूर गावाच्‍या पूर्व दिशेस एक मैल अंतरावर भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव आहे. तेथे औरंगजेबाच्‍या मुलीची कबर आहे.
माचणूर हे गाव सोलापूर-पंढरपूर रस्त्यावर आहे. सोलापूरला रेल्‍वे किंवा बसने पोचता येते. तेथून एस.टी. ने त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास करून माचणूरला जाता येते. पंढरपूरला रेल्‍वेने पोचण्‍याची सोय आहे. तेथून एस.टी. पकडली तर एकवीस किलोमीटर अंतरावर माचणूर गाव लागते. ते गाव मंगळवेढ्यापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.

सोलापूर – पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वहात जाणार्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या मंदिराजवळच माचणूरचा किल्ला आहे.
इतिहास : दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता. त्यांच्या पासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५ च्या आसपास किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. औरंगजेब या किल्ल्यात बसून न्यायदान करीत असे.या किल्ल्याच नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर सैनिकांना सिध्देश्वराची पिंड (शिवलींग) फोडण्याची आज्ञा केली. त्याकामासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. याप्रकारने संतापलेल्या औरंगजेबाने शंकराचा उपमर्द करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले, पण शंकराच्या पिंडीच्या पुढ्यात नैवेद्याचे ताट ठेवून त्यावरील कापड बाजूला केल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली.(त्यामुळे या ठिकाणाला मास – नूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले.) या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकार कडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते.
पाहाण्याची ठिकाणे : माचणूर गडाच्या प्रवेशव्दारावर शत्रूला थेट मारा करता येऊ नये यासाठी गडाच्या प्रवेशव्दारा समोर भिंत व दोन बुरुज उभारून आडोसा निर्माण केलेला आहे. गडाचे प्रवेशव्दार तटबंदी व बुरुज अजून शाबूत आहेत. प्रवेशव्दारातून गडात प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. प्रवेशव्दाराच्या विरुध्द टोकाला मशिद आहे. मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदीच्या मागिल बाजूस खोलवर भीमा नदीचे पात्र आहे. नदीच्या बाजूची तटबंदी पूरांमुळे नष्ट झालेली आहे.सिध्देश्वर मंदिर माचंणूर गावात प्रवेश केल्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर समुह लागतो. हा मंदिर समुह काळ्या पाषाणात बांधलेला आहे. या मंदिराच्या रचनेत व तुळजापूरच्या मंदिरात साम्य आहे. दगडी प्रवेशव्दातून प्रवेश केल्यावर दोनही बाजूला पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. पुढे प्रशस्त पायर्या उतरून दुसर्या प्रवेशव्दारापाशी पोहोचता येते. या प्रवेशव्दाराच्या भिंतीत दोन बाजूस वीरगळी बसवलेल्या आहेत. मंदिर तटबंदीने वेष्टित असून तटबंदीमध्येच ओवर्या काढलेल्या आहेत. मंदिरात ३ फूटी नंदी आहे. शिवलिंगा पर्यंत जाण्यासाठी २ दार आहेत. त्यातील पहील दार ५ फूट उंचीचे तर दुसरे दार २.५ फूट उंचीचे आहे.या खिडकी वजा दरवाजातून बसुनच गाभार्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मागिल बाजूस नदीवर दगडी प्रशस्त घाट बांधलेला आहे.
पोहोचण्याच्या वाटा : माचणूर गाव सोलापूर – पंढरपूर रस्त्यावर सोलापूर पासून ४३ किमी व पंढरपूरपासून २१ किमी अंतरावर आहे. तर मंगळवेढ्या पासून १२ किमी अंतरावर आहे. गावात जाणार्या रस्त्यावर प्रथम सिध्देश्वर मंदिर लागते व रस्ता संपतो तेथे माचणूरचा किल्ला आहे.


सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे या उतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला. माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर. औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगर पडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज दुमजली असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २०-२५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे. जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.---

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर माचणूर गाव आहे. या गावातून वाहणाऱ्या भीमा नदीच्या काठी असलेल्या प्राचिन सिध्देश्वर मंदिरामुळे हे गाव प्रसिध्द आहे. या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ इ.स.१६९४ ते १७०१ या काळात येथे होता. स्वत: औरंगजेब त्या काळात तेथे राहत असे. दक्षिणेतील राज्ये संपविण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्य़ांच्या अचानक होणाऱ्या हल्ल्यांनी त्रासला होता. मराठयांच्या अचानकपणे कोसळणाऱ्या टोळधाडीपासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने मूळ ब्रम्हगिरी गावाजवळ भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास हा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. या गावाचे नाव माचणूर पडण्याबाबत एक लोककथा सांगितली जाते. औरंगजेबाने हा भुभाग जिंकल्यावर सिध्देश्वराचे मंदिर उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने भयानक हल्ला चढविला व मंदिर उध्वस्त होण्यापासून वाचले. यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने शंकराचा अपमान करण्यासाठी त्याला नैवेद्य म्हणून गोमांस पाठवले पण पिंडीपुढे नैवेद्य ठेवल्यावर गोमांसाच्या जागी पांढरी फूले दिसली. मांसाचा नूर पालटला त्यामुळे या ठिकाणाला मासनूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे मासनूरचे अपभ्रंशाने माचणूर झाले. या प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिध्देश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. गावातुन किल्ल्याकडे जाताना किल्ल्याचा बुरुज व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. माचणूर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळाची रचना दिसुन येते. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते. गडाचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या दिसतात. उजव्या बाजुला तटाशेजारी पाण्यासाठी खोदलेला तलाव असुन त्यात खूप मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने नीट पहाता येत नाही. माचणूर किल्ला साडेतीन एकरात पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजघडीला बारा बुरूज दिसुन येतात. नदीच्या बाजूची किल्ल्याची तटबंदी पूरांमुळे पुर्ण कोसळली असुन या तटबंदीतील बुरुज नष्ट झालेले आहेत. उर्वरित तटबंदी १५-२० फुट उंच असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. काही ठिकाणी सिमेंटचा वापर करून पुरातत्त्व खात्याने तटबंदी दुरुस्त केल्याचे दिसते. तटबंदीवर चढण्यासाठी सहा ठिकाणी पायऱ्या असुन किल्ल्याला आपण शिरलेल्या प्रवेशद्वाराशिवाय अजुन दोन प्रवेशद्वारे दिसुन येतात. प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला एक पडकी मशिद असुन मशिदी समोर दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. मशिदी शेजारी डाव्या बाजुला तटबंदीला लागुन एक कबर दिसते. या कबरीशेजारील भिंतीवर एक पर्शियन शिलालेख दिसतो. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. येथील कोसळलेल्या तटबंदीचे अवशेष व खाली उतरणाऱ्या काही पायऱ्या पहाता या भागात देखील नदीच्या दिशेने उतरणारा दरवाजा असावा. माचनूर किल्ल्याला दोन बाजुनी नदीच्या पात्राने वेढले आहे. भीमा नदी या किल्ल्याला वळसा मारूनच पुढे जाते. दोन बाजूंना नैसर्गिक संरक्षण असल्याने या किल्ल्याचे स्थान भौगोलिकदृष्ट्या उत्तम आहे. उर्वरीत किल्ल्यात रान माजले असुन गावकऱ्यांनी किल्ल्यात एकही अवशेष व त्याचा दगडदेखील शिल्लक ठेवला नाही 
 
 







 
 
माचणूर किल्ला आणि सिद्धेश्वर मंदिर
मंगळवेढा ते माचणूर अंतर १३ते १४ किमी आहे. मला जीप ने २० मिनट लागली. माचणूर फाट्यावरून चालत  किल्ल्यात पोहचायला १० ते १५ मिनटं लागतात. पण त्या आधी मी जवळच असलेल्या श्री सिद्धेश्वरचा प्रचीन मंदिरात गेलो. मंदिरात दर्शन घेऊन मी किल्ल्याकडे निघालो.

सध्या किल्लाची फक्त तीन बाजूंची तटबंदी राहिली आहे. नदीच्या बाजूची तटबंदी राहिली नाही आहे, बाकी किल्ल्यात पूर्ण मोकळा मैदान दिसते. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर समोर नदी कडेच्या बाजूला एक छोटी वास्तू दिसते. तेवढीच एक वास्तू किल्ल्यात आहे. किल्ल्यात पहाण्यासारखं बाकी काही नाही. त्यामुळे किल्ला  बघायला १५ मिनटं पुरेशी होतात. मला तरी तेवढा वेळ लागला.

बेगमपूरचा दर्गाच वर्णन
पाच वाजता मी पुन्हा मुख्य रस्त्याला येऊन सरळ सोलापूरला न जाता. पुढेच १ किमी असलेल्या बेगमपुरला
(किंवा बेगमपूर फाट्याला) उतरलो. कारण बेगमपूरला एक दर्गाह आहे त्याला बेगाम्बी दर्गाह म्हणतात. हा दर्गाह जेव्हा आपण माचणूर किंवा मंगळवेढा कडे जातो, तेव्हा नदीच्या पुलावरून डावीकडे किल्ल्यासारखी तटबंदी असलेली मस्जिद नजरेस पडते. त्याचा आकर्षणामुळे मी ती बघायला गेलो.

मचणूर वरून चालत गेलो असतो, तर मला १५ मिनटं लागली असती. पण रस्त्याने जाणाऱ्या छोटा मॅक्स ट्रक वाल्याला सोडायला सांगितले त्यामुळे मी पाच मिनटात बेगमपूरला पोहचलो. मुख्य रस्त्यावरून दर्ग्यापर्यंत पोहचायला ५ मिनटं लागतात. दर्ग्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर पुरातत्व खात्याचा राष्ट्रीय संपत्तीं असलेला फलक आहे. दर्गा आतून पाहण्यापेक्षा दर्ग्याची बाहेरील किल्ल्यासारखी तटबंदी, विशेष करून नदीच्या बाजूची तटबंदी पाहण्यासारखी आहे. तीच पूलावरून आकर्षित करते.

तसेच दर्ग्याच्या बाहेर आल्यावर समोरच गावात छोटा दगडी दरवाजाची कमान दिसते आणि समोरच एक दगडाचा चौथरा दिसतो. नक्की ते कोणाचं घर होत का अन्य काही ते मला कळलं नाही. ते बघून मी पुन्हा मुख्य रस्त्याला आलो. दर्गा बघायला मला १० मिनटं लागली. संध्याकाळचे सव्वा पाच वाजले होते, त्यामुळे मी जास्त वेळ दर्गा न बघता गाडी साठी मुख्य रस्त्याला आलो. कारण संद्याकाळी साडे पाच नंतर सोलापूरला जायायला १ तासाने गाडी आहे. म्हणून मी जरा घाई करत मुख्य रस्त्याला एसटी थांब्याला गेलो. मला ५. २५ ची सोलापूर गाडी भेटली. 




किल्ले बेगमपुर..
ता.मंगळवेढा जि. सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १५ कि.मी अंतरावर भीमा नदीकाठी प्राचिन सिध्देश्वर मंदिर व माचणूरचा किल्ला आहे. औरंगजेब व त्याच्या सैन्याचा तळ सात वर्षे इ.स.१६९४ ते १७०१ या भागात होता. मराठयांच्या अचानकपणे होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने भिमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या सुमारास माचनुरचा किल्ला बांधला. या किल्ल्यात मुगल सैन्याची मोठी छावणी होती. किल्ला बांधुनही रात्रीच्या वेळी मराठे किल्ल्याबाहेरील छावणीवर हल्ला करून रसद व इतर सामान लुटून नेत. या हल्ल्यासाठी भीमा नदी ओलांडावी लागत असे पण मराठयांनी माचनुर किल्ल्यापासून एक मैल अंतरावर भीमा नदीला असणारा उतार शोधुन काढला होता व रात्रीच्या अंधारात मराठे याउतारावरून नदी ओलांडुन पलीकडे छावणीवर हल्ला करून लगेच मागे फिरत. हि गोष्ट औरंगजेबाच्या लक्षात आल्यावर त्याने हे हल्ले थांबवावे व माचनुर किल्ल्याला अधिक सरंक्षण मिळावे यासाठी नदीच्या उतारावर समोरील बाजुस एक लहानसा टेहळणीचा किल्ला बांधला तोच हा बेगमपुर किल्ला.
माचणूर गावाच्या पुर्वेस भिमा नदीपलिकडे बेगमपूर गाव असुन माचनुरहुन सोलापूरकडे जाताना भीमा नदीवरील पुलावरून किल्ल्याचे बुरुज, तटबंदी व त्यावरील चर्या आपले लक्ष वेधतात. बेगमपुरचे मूळ नाव घोडेश्वर
औरंगजेबची छावणी या भागात पडल्यावर त्याने घोडेश्वर नाव बदलुन बेगमपुर करण्यात आले. या भागातील उध्वस्त प्राचीन शिवमंदीर त्याची साक्ष देते. बेगमपुर गावातुन फिरताना मोडकळीस आलेले अनेक वाडे व मंदिरे दिसुन येतात. गावातुन किल्ल्याकडे जाताना सर्वप्रथम किल्ल्याच्या अलीकडेच एका गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार व त्यासमोर गलबताचा नांगरपडलेला दिसतो. गढीच्या मागील बाजुस ढासळलेले दोन बुरूज दिसुन येतात. बेगमपुर
किल्ल्यात शिरताना किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर रणमंडळ व त्याचे दोन बुरूज दिसुन येतात. यात शत्रुला सहजपणे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोहोचता येऊ नये यासाठी गडाच्या मुख्य दरवाजा समोर आडोसा निर्माण करून शत्रुला यात कोंडले जाते.
रणमंडळाचे व किल्ल्याचे प्रवेशव्दार, तटबंदी व बुरुज आजही शिल्लक आहेत.आत आल्यावर दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासाठी बांधलेल्या देवड्या असुन आतील बाजूने वर दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात. मूळ टेहळणीसाठी बांधलेल्या या किल्ल्यात नंतरच्या काळात खुप मोठे बदल केलेले दिसुन येतात. किल्ल्यातील दर्गा व मस्जिद या वास्तू किल्ला बांधणीच्या काळातील नसुन नंतरच्या काळात बांधलेली असावीत. किल्ल्याचे क्षेत्र एक एकरपेक्षा कमी असुन किल्ल्याच्या तटबंदीत आजही किल्ल्याचे आठ व रणमंडळाचे दोन असे दहा बुरूज सुस्थितीत दिसुन येतात. कोपऱ्यातील बुरुज असुन त्यांना वरील भागात जाण्यासाठी अंतर्गत पायऱ्या आहेत. बुरुजावरून तटावर जाता येते. मूळ १५ फुट असणारी तटबंदी नंतर २० - २५ फुटापर्यंत वाढवलेली असुन आजही चांगल्या अवस्थेत आहे व संपुर्ण तटबंदीवर फेरी मारता येते. किल्ल्याला आपण शिरलेल्या दरवाजाशिवाय उजव्या बाजुस दोन व मागील बाजुस एक अशी अजुन तीन प्रवेशद्वारे आहेत.प्रवेशव्दाराच्या समोरील बाजुस दुसऱ्या
टोकाला एक मशिद असुन मशिदी समोर
दगडात बांधलेल पाण्याच टाक आहे. किल्ल्याच्या डाव्या बाजुच्या कोपऱ्यातील दरवाजाने खाली नदीपात्रापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठी कबर असुन तिच्यासमोर उजव्या व डाव्या बाजुला तटाला लागुनच दोन कबरी आहेत. मध्यभागी असणारी कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची व समोरील तिच्या शिक्षकाची असावी असे सांगितले जाते. मशिदीच्या मागिल बाजूस नदीकिनारी असलेला बुरूज सर्वात उंच असुन हा भाग किल्ल्यापासून थोडा सुटावलेला आहे. या बुरुजावर थेट नदीतुन पाणी खेचण्यासाठी रहाट बसविण्याची सोय दिसुन येते. येथुन किल्ल्याला वळसा मारून दुरवर वाहत जाणाऱ्या भीमा नदीचे खोल पात्र दिसते. इ.स.१८८४ सालच्या सोलापूर जिल्ह्याच्या गॅझेटनुसार माचणूरच्या चंद्रभागेकाठी भव्य शिवालय आहे.जवळच औरंगजेबचा तळ होता. माचणूरच्या पूर्वेकडे एक मैलावर चंद्रभागेच्या पलिकडील किनाऱ्यावर बेगमपूर हे बादशहाच्या बेगमची कबर असलेले गाव आहे. सध्या हा किल्ला पुरातत्व 'खात्याकडे असुन संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे. पुरातत्त्व खात्याने अंतर्गत भागात काही ठिकाणी दुरुस्ती केली आहे.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर




No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...