मोकलोनी आस | जाहले उदास | घेई कान्होपात्रेस | हृदयात || असा धावा करणाऱ्या संत कान्होपात्रा यांची मंगळवेढा हीच भूमी. नायकीणीच्या घरात जन्माला आलेल्या कान्होपात्रा स्वत:च्या चारित्र्यसंपन्न अस्मितेसाठी लढा देतात आणि स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतात! त्यांच्या अभंगरचनांनी संतवाङ्मयाची समृद्धी वाढवली आहे.
अनुभव मंटपाच्या माध्यमाने लोकशाहीची मूळे रुजवणारे संत बसवेश्वर यांची कर्मभूमी म्हणूनही मंगळवेढ्याचा लौकिक आहे. समतेचा ध्वज घेऊन लोककल्याणाची बीजे पेरणारे संत बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात परिवर्तनाची क्रांती उभी केली ती त्याच भूमी सन १४६८ ते १४७५ या कालखंडातील दुर्गादेवीच्या दुष्काळात संत दामाजीपंतांनी गोरगरिबांसाठी धान्याची कोठारे लुटली आणि उपाशी जनतेची भूक भागवली. त्या इतिहासाने मंगळवेढा चौमुलखात गौरवशाली झाला.
त्या संतांबरोबरच मंगळवेढ्यात टिकाचार्य, लतिफबुवा, सीताराम महाराज खर्डीकर, मौनीबुवा, गोपाबाई, संत गोविंदबुवा, संत वडरी महाराज, संत बागडे महाराज, संत बाबा महाराज आर्वीकर. स्वामी समर्थ यांच्या पवित्र कर्माने, वाणीने संस्कारित झालेली ती भूमी आहे. महाराष्ट्राच्या सहिष्णू अभंग काव्याचे सार मराठी माणसाच्या रक्तात श्रद्धेचे अभिसरण करणारे आहे.

मंगळवेढ्याचा इतिहासः-
इ.स. सन १००० ते १२०१ :-संताच्या पदस्पर्शाने व देवदेवतांचे वास्तव्याने पुनित झालेल्या मंगळवेढे नगरीचा एतिहासिक परंपरेचा ठेवा अगदी थोडक्यात काही लोक अख्यायिकाच्या आधारे व पौराणिक माहीतीच्या आधारे दिला आहे. मंगळवेढे गावची ऎतिहासिक परंपरा अतिशय मोठी असून, अशी परंपरा लाभलेली गावे फारच कमी आहेत. मंगळवेढा हे गांव कधी काळी वसले याबद्दल निश्चित पुरावा नाही. परंतू फार प्राचीन काळापासून मंगळवेढा हे शहर मंगल राजचे अधिपत्याखाली होते. या गावची बाजारपेठ त्यावेळी अतिशय भरभराटीत चालू होती. मंगल राजाच्या अगोदर हे गांव जीवनपूरी असे म्हणून प्रसिध्द होते. सध्याच्या मंगळवेढ्याच्या पश्चिम दिशेस जमिनीचे उत्खनन करताना सोन्या, चांदीचे दागिने, जून्या वीटा, मातीची नक्षीदार सुंदर असलेली फुटलेले दगडी शिल्प अशा विविध वस्तू सापडत होत्या. परंतू कालांतराने जीवनपूरी या गावची वाताहत झाली. जीवनपूरीच्या पूर्वेस त्यावेळी निबीड असे अरण्य होते. त्यामुळे महाभयानक अशा अरण्यात मनुष्यवस्ती आजिबात नव्हती. जंगली हिंस्र स्वापदे व राक्षसांचे वास्तव्य त्या अरण्यात होते. व्दापारयुगात कौरव पांडवाच्या वेळी कौरवानी कपट दुताने खेळून पांडवाचे राज्य हिरावून त्यांना १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा दिली होती. तो वनवासाचा काळ भोगत असताना पाच पांडव धर्म, भीम, अर्जुन, नकुल व सहदेव फिरत फिरत त्या घनघोर अशा निबिड अरण्यात आले. महाभयानक हिंस्र पशुंच्या व क्रुर राक्षसांचे ते एक निवासस्थानच झाले होते. महाज्ञानी धर्म राजाने तेथील जमिनीची पाहणी केली. धर्म राजाने त्या जमिनीचा कस ओळखला. हे अरण्य नष्ट करून यातील जमीन सपाट केली तर निश्चितच येथे मनुष्यवस्ती होईल, लोक निर्भयपणे वावरतील, धर्मराजानी मनाचा ठाम निश्चय केला व अर्जुनास अनुज्ञा दिली. " अर्जुना, तुझ्या धनुर्विद्येच्या बळावर हे संपूर्ण घनघोर असे निबिड अरण्य जाळून टाक." धर्म राजाची आज्ञा शिरसावंद्य मानून अर्जुनाने धनुर्विद्येच्या जोरावर ते संपूर्ण अरण्य जाळून बेचिराख केले. परंतु तेथील जमीन उंच सखल भागात असल्यामुळे एक सपाट भाग जमीन दिसेना. ही जमीन सपाट कशी करायची? हे जिकीरीचे कष्टाचे व ताकदीचे काम कोणी करायचे? "माझ्या भीमाशिवाय हे काम करण्याची ताकद कोणात नाही", हे धर्म राजाने जाणले व भीमास पाठीवर थाप मारून सांगितले, " भीमराया तुझ्या महाकाय गदेने ही जमीन सपाट कर." धर्मराजाची आज्ञा मिळताच भीमाने प्रचंड गदेच्या प्रहाराने भिमा नदीपासून पश्चिमेकडील संपूर्ण जमीन भूईसपाट करून टाकली. परंतू हे काम करताना ती प्रचंड महाकाय गदा झिजून गेली. त्यामुळे भीमाने ती गदा भिमानदी व माणनदीच्या संगमात टाकून दिली. (सद्या भिमा व माणनदी संगमावर सरकोली हे गांव वसलेले आहे). व्दापारयुग संपले. नंतर कालांतराने बरीच वर्षे लोटली. नदीच्या प्रवाहाच्या पाण्याने संगमातील वाळू कमी होऊन त्या प्रचंड महाकाय गदेचे झिजलेले लाकूड उघडॆ पडले. ही परिस्थिती जुन्या जाणकार लोकांनी पाहीलेली होती अशी एक लोक अख्यायिका आहे.
देवगीरीचे यादव घराण्याचे बहामनी राजाने पराभव केल्यानंतर मंगळवेढे बहामनी राज्यात सामील झाले. बहामनी राज्याचे वेळीच इ.स. १४५८ ते १४६० या साली श्री. दामाजी पंतांचा प्रसिध्द दुष्काळ पडला व श्री. दामाजीपंत त्यावेळी तेथील तहसिलदार असल्यामुळे भुकेने व दुष्काळाने पीडीत झालेल्या लोकांकरीता त्यांनी पेवे लुटविली. त्याकरीता बादशहाने त्यांना कैद केले असता पंढरीच्या पांडुरंगाने विठु महाराचे रुप घेऊन दरबारात पैसा भरला व श्री. दामाजीपंतांची सुटका केली. नंतर मोगल सरदार बहादूर जिलाणी याने मंगळवेढे आसपासचा मुलूख जिंकला व मंगळवेढे दिल्लीचे मोगल अंमलाखाली इ.सन. १४६५ ते १४७५ पर्यंत होते. इ.सन १४९३ मध्ये मंगळवेढे येथे भुईकोट किल्ला बांधला गेला व हे एक प्रमुख व मजबूत लष्करी ठाणे म्हणून प्रसिध्द झाले. ता. ५/११/१४९४ रोजी बिदर बादशहा महबूबशा यांने स्वारी करून बहादूर जिलाणीचा पराभव करून व त्यास ठार मारून मंगळवेढे पुन्हा जिंकून आपल्या ताब्यात घेतले. इ.स. १३९६ ते १४०८ अशी बारा वर्षे दुर्गा देवीचा दुष्काळ या भागात पडला, त्यात मंगळवेढे ही सापडले. नंतर इ.स. १४२२ व १४२३ आणि इ.स. १४६७ ते १४७४ यासाली दोन मॊठे दुष्काळ पडून मंगळवेढे गावाची वाताहत झाली. दुष्काळामध्ये लोक गाव सोडून गेले, देश हैराण झाला. २० वर्षे मंगळवेढे गांव पडीक राहीला. गावात थोडीच घराणी राहीली म्हणून परगावातून व लांबून मॊठी घराणी येथे आणुन त्यांना जमिनी देऊन पुन्हा वसाहत करावी लागली. नागांवचे प्रतापरुद्र इंगळे यांना आणुन देशमुखी करून दिली.
आलूर अचालेरे येथून भानशेट होनराव यांस आणून देशमुखीच्या तीन तक्षिमा करुन दिल्या. अनग-यातून कोयाजी बीन नागदेव यांस आणुन देशमुखीच्या चार तक्षिमा केल्या. विठठल कसगावडा, चंडरस कुलकर्णी ही घराणी गावांतच होती. त्यांना पाटील कुलकर्णी वतने दिली. परगावाहून खालील......
फुगारे, भगरे, हजारे, जठार, उन्हाळॆ, कौंडुभैरी, धावलिंग, मुरडे, ताड, टकले, आयवड, शहाजादे, कानुइंगळे, तानगावडे, तीपनाईक, कसगावडे, गवळी, चौगुले, नाडगौडा, बोधले, जोगण, जावळे, बहीरजी, ढवण, जोशी, काटकर, घाटूळ, घुले, चौधरी, महाजन, खराडे, वाकडे, भांगे, आवताडे, उमाटे, गुंगे, मुदगुल, बोमण्णा, वठारे, यादवाडचे होनमाने इत्यादी घराणी मंगळवेढ्याला आली.
या लोकांनां ज्या ज्या भागात जमिनी दिल्या तेथील झाडी तोडून जंगल साफ करून त्यांनी शेती केली. त्या त्या स्थळाला त्यांची नावे दिली असून आजही मंगळवेढे शिवारातील जमिन अमक्या स्थळात आहे अशी ओळखली जाते. सर्व स्थळे मिळून ७२ भागात मंगळवेढेची जमीन वाटली गेली आहे. इ.सन. १४८९ मध्ये मंगळवेढे गांव जिंकून विजापूरच्या अदिलशाहीने आपल्या राज्यात सामिल केला.
इ. सन. १६०० ते १७००
पुरंदरचा तह झाल्यानंतर विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळकीमुळे मंगळवेढा हे ठिकाण त्या काळात महत्त्वाचे होते. १६६५ मध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत आदिलशाही विरुद्ध मोहीम काढली फलटण - खटावमार्गे मंगळवेढ्याकडे येत असताना महाराजांनी नेताजी पालकरांना मंगळवेढा किल्ला ताब्यात घेण्यासाठी पुढे पाठवले नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला.दरम्यान शिवाजी महाराजांनी सोबतच्या घोडदळ व पायदळाबरोबर कोसभर अंतरावर असलेल्या कृष्ण तलावावर पाण्याची सोय व सुरक्षित ठिकाण असल्याने ते थांबल्याचे काही इतिहासकारांनी पुस्तकात नमूद केले.
त्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजे २० डिसेंबर १६६५ ला मंगळवेढा किल्ल्यात महाराजांनी प्रवेश केला. २७ डिसेंबर पर्यत हा भुईकोट किल्ला व बाहेर १३ बुरूज आणि तटबंदी असल्याने सुरक्षित ठिकाण म्हणून किल्ल्यात मुक्काम केला. हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झाराजे जयसिंगाने दिलेरखानाला किल्ला उद् ध्वस्त करण्याची आज्ञा केली. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. १६८५ मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उद्ध्वस्त झालेला किल्ला ताब्यात घेतला. इ.सन. १६९५ ते १७०२ औरंगजेबचा मुक्काम मंगळवेढ्यापासून नऊ मैलावर बेगमपूर येथे होता. साधारणत:२०० वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली.
इ. सन १७०० ते १८००
इ. सन १७०० नंतर मोगल अंमल संपून हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. श्री छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना प्रमूख नेमले. इ.सन. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल होता. त्यानी सध्या उभी असलेली चौबुर्जी इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. इ. सन. १७४२ ते १७५० पर्यंत पंतप्रतिनिधीचा अंमल असून यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते. इ.सन. १७५० पासून प्रथक कमाविसदार म्हणून मंगळवेढ्यास आले. नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या सरंजामांत हा किल्ला इ.सन १७५१ साली दिला गेला. पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. गोविंद हरी पटवर्धन यांच्यावर पेशवे दरबारची इतराजी झाली. त्यावेळी ते मंगळवेढे येथे किल्ल्यात येऊन राहीले होते. त्यावेळी त्यांनी श्री संत दामाजी महाराज यांची सेवा केली म्हणून त्यांना त्यांच्या कृपा प्रसादांमुळे जहागिर परत मिळाली अशी त्यांची श्रध्दा होती. पुरुषोत्तम दाजी पटवर्धन हे मघ:श्याम याचे नातू होते. ते मंगळवेढे येथे राहत असत. इ. सन १७५५ साली श्रीमंत नानासाहेब पेशवे, श्रीमंत भाऊसाहेब पेशवे व श्रीमंत दादासाहेब पेशवे हे मंगळवेढे येथे येऊन काही दिवस राहीले होते. त्यावेळी मंगळवेढे परगणा होता व आंबेगाव (सध्या आंबे-चळे म्हणुन असलेला गाव) मंगळवेढे परगण्याखाली होता. तो गांव त्यावेळी श्रीमंत पेशव्यांनी नारायण कृष्ण व पुरुषोत्तम कृष्ण यांना इनाम करुन दिला. श्री. पुरुषोत्तम दाजी हे श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा खून झाला त्यावेळी मंगळवेढ्यास राहात होते. दाजी मोठे शुर असून त्याचे वक्तृत्व चांगले होते. ते धाडसी असून पराक्रमी होते. म्हणून श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या वधानंतर त्यांच्या पत्नी गंगांबाईसाहेब या गरोदर असताना त्यांना संभाळण्याकरीता मुद्दाम श्रीमंत दाजीसाहेब पटवर्धन यांना नाना फडणिसांनी पुण्यास बोलावून नेले होते. दाजी मरण पावल्यानंतर त्यांच्या पत्नी आंब्यास राहावयास गेल्या. इ.सन. १७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास आला होता. पण मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले. पहिली सरदारकी मिळाली. इ.सन. १८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धण घराण्याकडे होते.
इ. सन १८०८ ते १९०० मध्ये पटवर्धन घराण्याच्या वाटण्या होऊन मंगळवेढे तालूका श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर पटवर्धन यांचे वाटणीस गेला. इ.सन. १८१८ मध्ये मंगळवेढयाहून तीस मैलावर असलेल्या अष्टी गावी शेवटची मराठा व इंग्रज यांची लढाई होऊन मराठा साम्राज्य लयास गेले व पेशवे यांचे सेनापती बापू गोखले हे धारातिर्थी पडले.
आजही मंगळवेढे गावात सेनापती बापू गोखले यांचा वाडा पडक्या स्थितीत आहे. श्री संत चोखामेळा चौकातुन पुर्वेस मारवाडी गल्लीतून थोडे पुढे गेलो की आपणास उजव्या हातास तो वाडा आहे. आपल्या तलवारीचे तिखट पाणी इंग्रजास पाजून मराठी साम्राज्य टिकविण्याची खटपट करणारा हा शुर योध्दा मंगळवेढे येथे राहत होता. याचा अभिमान मंगळवेढे जनतेस आज पाहीजे. पण मंगळवेढ्याची जनता बापू गोखले यांना आज विसरली आहे व त्यांचे गावात कोठेही स्मारक नाही. मराठी राज्य गेले पण महाराष्ट्राचे मन इंग्रजानी संपूर्ण मारलेले नव्हते. इ. सन. १८५७ साली उत्तर भारतात स्वातंत्र्याचा प्रयत्न होताच त्याचे पडसाद ही मंगळवेढे गावात उठले. काही प्रत्यक्ष कृती करीत होते. इंग्रजी सरकार संशयावरुनही पकडून लोकांना त्रास देत होते. स्वातंत्र्य युध्दात भाग घेतला म्हणून मंगळवेढ्याहून श्री. नारायणराव नाना पटवर्धन, भास्करराव जंमखंडीकर, आलमसाहेब काझी व एक मराठी ग्रहस्थ यांना ता. १/१२/१८५७ रोजी पकडून सातारा येथे चौकशीकरीता नेले. पण नंतर त्यांना सोडून देण्यात आले. पहिले श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब नंतर श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब हे सांगली संस्थानाचे अधिपती झाले. त्यांना १८५९ साली मुखत्यारी आली. त्यांचे कारकार्दीत सांगली संस्थानाचा कारभार काही वर्षे ब्रिटीश सरकारखाली होता. इ. सन १८७६ पर्यंत हा किल्ला मजबूत व शाबूत होता. सांगली संस्थानात ब्रिटीश ऍडमिनिस्ट्रेशन आल्यामुळे जॉईंट ऍडमिनिस्ट्रेशन कॅप्टन वेस्ट यांनी किल्ल्याचे दरवाजे कायमचे पाडले व मेजर वॉलरने तट पाडला. तटाची माती व दगड लोकांनी नेली व खंदक ही बुजवला गेला. काही बुरुज पडले काही बुरुज मुद्दाम पाडले गेले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाले आणि १९/०२/१९४८ रोजी ज्यावेळेस सांगली संस्थानाचे भारतात विलिनीकरण झाल्यानंतर मंगळवेढे हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालूका झाला.

श्री दामाजीपंत चरित्र :-
बहामनी राज्यहसन गंगूने इ.स. १३४७ मध्ये बहामनी राज्य गुलबर्गा येथे स्थापले. इ.सन. १४२९ मध्ये बिदरला अहमदशहा याने राजधानी आणली. अहमदशहावल्ली या नावाच्या बादशहाने इ.सन. १४२२ ते १४३५ पर्यंत राज्य केले. सर्व बहामनी बादशहामध्ये हा चांगला बादशहा होऊन गेला. त्यावेळी बिदर येथे दामाजी म्हणून एक कारकून दरबारात चमकला. मुसलमानी राज्य बिदरला असल्यामुळे हिंदू लोकांना धर्म पाळण्यास फार अडचण पडत होती. दरबारामध्ये मुसलमान नोकरांबरोबरच हिंदू लोकांचाही भरणा होता. त्यातच दामाजीचीही नेमणूक बहामनी दरबारात झाली. त्यावेळी बिदरचा किल्ला संपूर्ण बांधून तयार झाला होता.
दामाजीपंतास रोज तख्त महालात बसून दफ्तर संभाळावे लागे व काम करावे लागे. पंचवीस वर्षे वय असले तरीही दामाजीपंतांचा चेहरा श्रध्दाळू व भाविक दिसत असे. रोज स्नान करून कपाळावर मोठा गंध लावण्याची त्यांची प्रथा होती. दरबारात येतानाही ते टिळा लावून येत असे. त्यामूळे चटकन ते लोकांच्या डोळ्यात ते भरत असत. त्यांची अंगकाठी व शरीरयष्टी कमवलेली होती. ते घोड्यावर बसण्यात पटाईत होते व दांडपट्टा चांगला खेळत असत. त्यांचे मोडी अक्षर मोत्यासारखे वळणदार होते. त्यामूळे त्यांच्या कामावर त्यांचे वरिष्ठ खूष असायचे. दामाजीपंतही प्रामाणिकपणे काम करायचे, त्यामूळे वरिष्ठांची त्यांच्यावर मर्जी बसली. अहमदशहावल्ली हे बादशहा चांगले असल्याने हिंदूच्या अंगचे गुणांचे सुध्दा ते कौतुक करायचे.
एकदा दफ्तरखान्यातील सर्व कारकून काम संपवून गेले तरी सायंकाळी दामाजीपंत काम करीत बसलेले आढळले.
बादशहा दामाजीपंतास म्हणाले..."अभी तक काम कर रहे हो?"
त्यावर दामाजी पंतानी उत्तर दिले..." आज का काम अबतक पुरा नहीं हुआ, वह पुरा कर रहां हूं। हर रोज काम पुरा करके ही घर जाने की मुझे आदत है ।"
हे ऎकून बादशहास फार आश्चर्य व आनंद ही झाला.
बादशहा म्हणाले.." इस तरह काम करके तुझे क्या मिलेगा? तुम्हारे साथ काम करने वाले सब चले गए।"
त्यावर दामाजीपंत म्हणाले... "काम का बदला देना ईश्वर के हाथ में हैं, मैं अगर मेरा फर्ज पुरा करूं तो उससे मुझे दिल की तसल्ली मिलती है।"
बादशहा म्हणाले..." तेरा ईश्वर कहॉं हैं?"
दामाजीपंत ..."मेरा ईश्वर हर जगह मौजुद है।"
या संभाषणाने बादशहा खूष झाला आणि त्यांनी दामाजीपंतांची बढती नायब तहसिलदार म्हणून केली.
अहमदशहावल्ली नंतर त्यांचा मुलगा अल्लाउद्दीन दुसरा बादशहा झाला. तो पराक्रमी होता. त्यांने बिदरचे साम्राज्य वाढवले. त्यावेळी दामाजीपंतास नायब तहसिलदार म्हणून सैन्यांबरोबर जावावे लागायचे.
वयाच्या ४० व्या वर्षी पंढरपूरच्या पाडूरंगाचे दर्शन घेण्याचा योग त्यांना प्रथम आला व पंढरपूरचा दिव्य सोहळा पाहून ते वारकरी पंथाचे अनुयायी झाले. पांडूरंगाचे निस्सीम भक्त म्हणून धार्मिक गोष्टीकडे विशॆष लक्ष देऊ लागले. गीतेच्या पठनाबरोबर ज्ञानेश्वरीचे वाचनही ते आवडीने करू लागले. त्यावेळी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व ठिकाणी उपलब्ध नव्हता, तरीही दामाजीपंतानी ती प्रत मिळवून त्याचे अध्ययन सुरु केले. दरबारातही हुशार, संत प्रवृत्तीचा अधिकारी म्हणून दामाजीपंतांची ख्याती झाली.
मंगळवेढ्यात आगमन
दामाजीपंतांची भार्या (पत्नी), सावित्रीबाई ही सुध्दा एक अनुरुप अशी साध्वी, सुशील, पतिव्रत्ता होती. सावित्रीबाईंनां लिहीणे वाचणे येत असे. लहानपणी ती आई-वडिलांना पोथ्या-पुराणे वाचून दाखवयाची. त्यामुळे तिला रामायण, महाभारत यामधील गोष्टी चांगल्या माहिती होत्या. तीसुध्दा श्रध्दाळू असल्याने, आलेल्या पाहूण्यांचा अतिथी सत्कार करणे, सुगृहिणी म्हणून चांगला प्रपंच करणे, दानधर्म करणे वगैरे गोष्टी ती व्यवस्थितपणे पार पाडायची. कोणीही व्यक्ती दामाजीपंतांच्या घरातून विन्मुख जात नसे. दामाजीपंत नौकरीनिमित्त परगावी गेल्यास सावित्रीबाई घरचा कारभार चांगल्या पध्द्तीने सांभाळीत असत.इ.सन. १४५० मध्ये दुसरा अल्लाउद्दीन बादशहा राज्य करीत असता, त्याचा भाऊ, राजपुत्र, अहमदशा याने स्वतंत्र होण्याच्या इच्छेने सैन्य जमवून सोलापूर व त्याच्या आसपासचे किल्ले घेतले. तेंव्हा त्याचे परिपत्य करण्याकरिता बादशहा अल्लाउद्दिनने सैन्य पाठविले. त्यामध्ये दामाजीपंतांना तहसिलदाराचे अधिकार देऊन व सैन्यातही नायबसुभेदाराचे अधिकार देऊन सैन्याबरोबर पाठवले. या सैन्याने अहमदशा याचा पराभव करून त्यास रायचूर कडे पिटाळून लावले, व सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, कासेगांव वगैरे सर्व मुलूख पुन्हा अल्लाउद्दीन बादशहाच्या अधिपत्याखाली आला. व दामाजीपंतांची नेमणूक मंगळवेढे ठाण्यास सुभेदार व तहसिलदार म्हणून झाली. दामाजीपंत सावित्रीबाईसह मंगळवेढ्यास येऊन बहामनी राज्याचा प्रतिनिधी म्हणून काम पाहू लागले.
पंढरपूर हे त्याकाळी तीर्थक्षेत्र म्हणून फारसे प्रसिध्दीस आलेले नव्हते. दामाजीपंत तहसिलदार म्हणून मंगळ्वेढ्यास आल्यापासून दर एकादशीस सपत्नीक जाऊन, चंद्र्भागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेत असत. एवढेच नव्हे तर विठठलाचे दर्शन घेण्यासाठी ते पंढरपूरला वारंवार जात असत. पंढरपूरास वारीकरिता मंगळवेढ्याहून वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणावर जाऊ लागली. स्वत: श्री दामाजीपंतानी पांडूरंगाच्या भक्तीकरिता लोकांना प्रोत्साहन दिल्यामुळे, मंगळवेढ्यामध्ये भजनी मंडळी व वारकरी संप्रदाय यांचा फार मोठा प्रसार झाला. मंगळवेढ्याचा दामाजीपंतांचा वाडा हे वारकरी लोकांचे आश्रयस्थान झाले. व पंढरीस जाणारे दिंड्या, भजनी मंडळी मंगळवेढ्यास राहून दामाजीपंतांचे दर्शन घेऊन पंढरपूरास जाऊ लागले. दामाजीपंताचीही दिवसेंदिवस संत म्हणून ख्याती वाढू लागली.
दामाजीपंत तहसिलदार झाल्यापासून मंगळवेढ्याचा कारभार सुधारला. लोक सुखी व आनंदी झाले. परचक्राची भीती नाहीशी झाली. बहामनी राज्य जरी असले तरी, बिदरपासून दूर असल्याने मुसलमानांपासून होणारा उपद्र्व कमी झाला व दामाजीपंतांच्या कारभारामुळे प्रजा सुखी व संतुष्ट झाली. तिकडे बिदरला दुसरा अल्लाउद्दिन बादशहा मयत झाला. व जालीम हुमायूनशहा या बादशहाचा जहरी अंमल सुरु झाला.
बिदरचा बादशहा हुमायूनशहा इ. सन. १४५८ साली गादीवर आला व बिदरला जूलमी राजवट सुरु झाली. हा राजा इतका क्रुर, विषयलंपट व राक्षसी स्वभावाचा होता की फेरिस्तासारख्या इतिहासकारानेही त्याला जालीम ही उपाधी दिली. या बादशहाने आपल्या भावास क्रुर भूकेल्या वाघाच्या तोंडी देऊन मारविले. आपल्याविरुध्द कोणी बोलत असल्याचा जरी नुसता संशय आला, तरी तो त्याचा शिरच्छेद करण्यास मागेपुढे पाहत नसे. हजारो लोकांनां किल्ल्यात आणून हालहाल करून मारले जात असे.
अशा या क्रुर राजेशाहीत बिदरपासून १२० ते १३० मैल लांब असलेल्या मंगळवेढ्याला दामाजीपंत तहसिलदार म्हणून सन १४५८ ते १४६० पर्यंत काम करीत होते आणि याच वेळेस दामाजीचा दुष्काळ म्हणून प्रसिध्द असलेला दोन वर्षाचा दुष्काळ मंगळवेढ्याच्या आसपास पडला होता.

दामाजीपंतांचा दुष्काळ
इ.सन १४५८ उजाडले, व पावसाने अशी काय दडी मारली की तब्बल दोन वर्षे पाऊस बिलकुलही पडला नाही.मंगळवेढयाच्या आसपासचा सर्व मुलूख दुष्काळाच्या खाईत लोटला गेला. पंढरपूर, सोलापूर, सांगोला, विजापूर या सर्व भागातील लोक भूकेने मरू लागली. त्यावेळी दळणवळणाची साधने फारशी नव्हती. रस्ते नव्हते. जवळपासच्या कोणत्या मुलखांत सुबत्त आहे याची माहीती जनतेस कळत नव्हती. त्यामुळे स्थलांतर करून अथवा परठिकाणांहून माल आणून दुष्काळग्रस्त लोकांना पुरविण्याची सोय नव्हती. धान्य महाग झाले, तरीपण धान्य मिळेना. लोक पैसा व दागिने घेऊन अन्नासाठी हिंडू लागले. त्यातच गांवातील विहीरी व तळी आटू लागली. गुरांनां पिण्यास पाणी व खाण्यास वैरण मिळेना. लोकांनी प्राणांपेक्षा प्रिय असलेली गुरें मोकळी सोडून दिली. गुरांना बाजारातही कोण विकत घेईना. घरातले धान्य संपले म्हणून लोक भीक मागू लागली. कोणी भिक घालेना, म्हणून लोक रस्त्यावरच उपाशी पोटी पडू लागली. तरूण लोकांपेक्षा, वृध्द व लहान मुलांचे हाल बघवेनासे झाले. पंढरपूरला ही लोकांचे या दुष्काळामुळे हाल झाले. चंद्र्भागा गोठली, तीत लोकानी पाण्यासाठी झरे काढले.
त्यावर्षी मंगळवेढ्याला मात्र चमत्कारस्वरूप जो काही थोडाफार पाऊस पडला होता, त्यावर या ठिकाणी पिके आली होती. सरकारी वसून धान्यरुपाने झाला होता आणि ६०० खंड्याची गंगा व जमुना ही दोन मोठी कोठारे ज्वारीने भरलेली होती. मंगळवेढ्यातील लोकांच्या घरीही पुरेल एवढे धान्य होते. दामाजीपंताच्या आश्रया खाली लोक सुखी होते.
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ॥
ही कृती प्रत्यक्ष दामाजीपंत व मंगळवेढ्याचे लोक आपल्या कार्यातून दाखवत होते. परगावचा कोणीही पांथस्थ गांवी आला की तो उपाशी पोटी परत जात नसे. मंगळवेढे येथे गेल्यास पोटभर खावायास मिळते ही बातमी वणव्यासारखी चोहोकडे पसरली. एक वेळचे जेवण मिळावे म्हणून बारा-बारा मैल चालत लोक मंगळवेढ्याला येऊ लागले. लोक १०० ते २०० च्या जमावाने येऊ लागले. सगळीकडॆ हाहाकार माजला. लोकांना भुकेपोटी अन्न व पाण्याशिवाय दुसरे काहीच प्रिय राहीले नाही. वर्ष संपत आले तरी दुष्काळाच कहर अजून सुरुच होता. मंगळवेढ्यातील लोकांच्या घरातील धान्य कमी होऊ लागली..परिणामस्वरुप मदत म्हणून भुकेल्या लोकांना अन्न देण्यासाठी त्यांचे हात आता आखडू लागले. १४६०चा पावसाळा लागला खरा, पण पाऊस कुठे आहे? हे वर्ष पण गेल्यावर्षासारखे दुष्काळातच जाते की काय याची भीती आता लोकांना वाटू लागली. आणि नेमके तसेच झाले, सर्व नक्षत्रे पावसाशिवाय गेली...पुन्हा एकदा दुष्काळ..
आता मंगळवेढे गावचे लोकांचेपण धान्य संपले. लोक दामाजीपंतांच्या वाड्यासमोर जाऊन धरणे धरुन बसली. दामाजीपंताची पत्नी सावित्रीबाईनी वेळ ओळखून आपल्या वाड्यात धान्य साठवून ठेवले होते. वाड्यावर आलेला, भुकेने व्याकूळ झालेले लोक, पंगतीने जेवण करुन जात असत. पण वाड्यावरचे ते धान्य पण किती वेळ या लोकांची भूक भागवणार. ते ही धान्य संपले. पण दामाजीपंताच्या वाड्यासमोरील भुकेल्या लोकांची गर्दी काही हटेना
कोठारात धान्य आहे पण..?
दामाजीपंतांनी बिदरास दुष्काळाची हकीकत कळविली. पण जालीम हुमायूनशहापर्यंत ही हकिकत कोण सांगणार? चैनीत, जनानखान्यातील ऎश आरामात बादशहा दंग होता. महमद गवाण सारखा हुशार दिवाण होता. पण तो या जालीम बादशहापूढे काय करणार? अनियंत्रित राजसत्ता म्हणजे किती कठोर व लहरी! प्रजा दुष्काळामुळे मरू लागली तरी बादशहास त्याचे काय? त्याची चैन चाललीच होती. दामाजीपंतांनी एक नाही दोन सांडणीस्वार पाठवले. दरबाराकडून मदत मागविली पण उत्तर नाही. शेवटी मंगळवेढ्याच्या कोठारातील धान्य दुष्काळग्रस्तांना विकत देण्याची परवानगी मागितली, पण त्याचेही काहीही उत्तर नाही. त्याकाळी बिदरहून मंगळवेढ्यास पत्र येण्यास आठ ते पंधरा दिवसही लागत. पण गरिबांनां, उपाशी लोकांना हे सर्व काय माहित? ते दामाजीपंतांनाच गरीबांचा वाली, कनवाळू समजायचे, आणि त्यांच्या वाड्यापूढे याचना करत असत. त्यातच इतरच्या परिसरातील, पंढरपूरातील लोकांनी, दामाजीपंताकडे गेले की जेवण मिळते, धान्य मिळते हे समजल्याने, आसपासचे लोकही मंगळवेढ्याकडॆ धान्यासाठी येऊ लागली. अनेक लोक या भयान दुष्काळाने मृत्युमुखी पडलेदामाजीपंत व त्यांची पत्नी, सावित्रीबाई, हे दृश्य पाहून भयभीत झाले. घरातील धान्य, पैसा वगैरे सर्व काही संपले होते. या सर्व लोकांना काही नाही म्हणून सांगायचे त्यांच्या जीवावर आले. दामाजीपंतांच्या डोळ्यासमोर धान्याची कोठारे दिसू लागली. दामाजीपंत विठठलाची आळवणी करू लागले. पंढरपूरकडॆ तोंड करून हात जोडून ते बसले व म्हणाले--- "बा..परमेश्वरा, बिदरहून कोठारातील धान्य फुकट देण्याची नाही का होईना, पण विकत देण्याची तरी लवकर परवानगी येऊ दे." दामाजीपंत नामस्मरण करत ध्यानस्थ बसले. बराच वेळ गेला. लोकांची आरडाओरड, रडारड अधिकच वाढली. कुठला स्वयंपाक आणि कुठले जेवण? सारे लोक दामाजीपंतापुढे उपाशीपोटी, उदास चेहरा करून बसले होते.
दामाजीपंतांनीही सकाळपासून तोंडात पाणीही घातले नव्हते. घरातून त्यांची पत्नी सावित्रीबाई बाहेर आली.
सावित्रीबाई -- "(दामाजीपंतांस) आता उठावे घरात तरी चलावे.
दामाजीपंत --" काय करू घरात येऊन? माझा हा जनताजनार्धन परमेश्वर उन्हातान्हात उपाशी बसला आहे."
सावित्रीबाई --- " मग आता या लोकांनां काय द्यावयाचे?"
दामाजीपंत --- " आता सरकारी धान्य कोठाराशिवाय काही नाही. पण अजून बादशहाकडून हे धान्य विकण्याची परवानगी आली नाही. काय करावे?"
सावित्रीबाई --- " परवानगी मागाहून येईल, तोपर्यंत या लोकांना धान्य दिले तर लोक तरी वाचतील.
दामाजीपंत --- "परवानगी शिवाय धान्य दिले म्हणून बादशहाला माझा राग येईल. मला शिक्षा म्हणून तोफेच्या तोंडी अथवा फाशी जावे लागेल. तुला बादशहा किती क्रुर आहे, माहीत आहे ना? मी फाशी गेलो तर तुला चालेल काय?"
सावित्रीबाई--- "असे अभद्र काय बोलता हो? कुठल्या बायकोस आपला नवरा फाशी जावा असे वाटेल !"
दामाजीपंत --- "हजारो लोकांचे प्राण वाचवण्याकरिता माझा एक जीव जात असेल तर हजारो जीवांकडे पाहायचे की स्वत:च्या प्राणाकडे पाहायचे? तुला नवरा प्रिय आहे हे खरे, पण हा जनताजनार्धन परमेश्वर नव-याहून प्रिय नाही का?"
सावित्रीबाई -- " मला असे पेचात पाडू नका. मला तुम्ही पाहिजे आणि जनताजनार्धन परमेश्वरही पाहिजे. तुम्हीच माझे परमेश्वर आहात, तुम्हास सोडून मी कशी राहीन?"
दामाजीपंत ---" हे बघ वेळ कठिन आहे. मायामोह यावेळी आवरला पाहिजे. जगाच्या कल्याणाकरिता स्वत:च्या घरादारावर निखारा ठेवण्याची पाळी आली तरी माणसाने स्वत:च्या घराचे बलिदान जगाच्या कल्याणाकरिता केले पाहिजे. पहा---पहा... डोळे मिटून, चिंतन करून, जनताजनार्धनाला. पंढरीच्या विठ्ठलाचे रुप आठव. मला तर यावेळी या पेवातील धान्य गरीब भुकेल्या जनतेला फुकट वाटावे असे वाटते. ते पैसा कुठला देणार? माझा एकट्याचा जीव हजारो जीवांपेक्षा मोठा आहे काय?"
सावित्रीबाई --- " नाथ, आपण एकटेच का? मीही तुमच्याबरोबर फाशी अथवा तोफेच्या तोंडी जाण्यास तयार आहे. पण परमेश्वर आपला पाठिराखा आहे. तो भक्तांना अशा संकटातून रक्षितो, असा माझा विश्वास आहे."
या प्रमाणे दामाजीपंतांचे आणि सावित्रीबाईचे बोलणे चालू असता, बाहेर जमलेल्या लोकांमध्ये जास्तच आरडाओरड व गोंधळ माजला. खूप वेळ झाला तरी पंतांच्या वाड्यासमोर बसूनही काही मिळॆना. दामाजीपंतांच्या नावे हाका मारून लोक जास्तच गयावया करु लागले.
बिदरहून सरकारी पेवातील धान्य देण्याचा हूकूम येईना. तेव्हा दामाजीपंतांनी तहसील कचेरीतील हाताखालच्या सर्व नोकरांना बोलावले व विचारविनिमय केला. पण जालीम हुमायूनशहा बादशहाचे क्रुरपणाचा व जुलमी राजवटीचा वचक सर्वांना असल्यामुळॆ कोणीच दामाजीपंतांना सरकारी कोठारातील धान्य या गरीब जनतेला द्यावे, असा सल्ल देईना. दामाजीपंत पुन्हा अस्वस्थ झाले. काय करावे त्यांना सुचेना. आपल्या वाड्यातील देवघरात जाऊन देवापुढे ध्यान लावून ते बसले. बराच वेळ झाला, दामाजीपंत देवघरातून बाहेर येईनात. वाड्यातील सदरेवार जमलेले लोक दुष्काळ पिडितांचे हाल पाहून अस्वस्थ झाले. इतक्यात देवघरातून दामाजीपंत गंभीर मुद्रा घेऊन बाहेर आले, आणि अंगरखा आणि पगडी घालून तहसिल कचेरीत निघाले. धान्य कोठाराच्या रक्षकांनां व अधिका-यांना त्यांनी बोलावणे पाठवले. त्यांच्या मागून घरापूढे जमलेले गरीब, भूकेने व्याकूळ झालेले लोक पण निघाले. तहसिल कचेरीत येताच दामाजीपंत सर्वांपूढे हात जोडून उभा राहीले, त्यांच्या मुखावर सात्विक तेज दिसत होते. मनात काहीतरी निश्चय केल्याचे दिसत होते. ते सर्वांना म्हणाले---- " इतका वेळ बादशहाची परवानगी येईल, म्हणून मी वाट पाहिली पण परवानगी आली नाही, व तुमचे हाल ही मला पाहवत नाही. म्हणून तुम्ही या कोठारातील थोडॆ थोडे धान्य घेऊन जावे व आपले जीव जगवावे". एवढे बोलून श्री दामाजीपंतांनी कोठाराची कुलपे काढण्यास रक्षकास सांगितले व पेवातील धान्य जितके पाहिजे तेवढे नेण्यास सांगितले. लोक आनंदून गेले. पेवाच्या दारात लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्या. ते दामाजीपंतांना व सावित्रीबाईंना आशिर्वाद देऊन धन्य धन्य तुझी दामाजीपंता असे म्हणून जात असत. हे कोठार लुटण्याचे काम आठ दिवस चालले होते. दामाजीपंतांच्या या कृत्याची चहूकडे वाहवा झाली. दामाजीपंत व सावित्रीबाई, दोघेही शांत चित्ताने राहीली, बादशहा कुठलीही शिक्षा देऊ, ते सोसण्याची तयारी त्या दोघांनी केली होती.

दामाजीपंतांस अटक
या जगामध्ये सज्जन थोडे आणि दुर्जन फार आहेत. चांगल्या कार्याची वाहवा दुर्जनांनां बघवत नाही. मंगळवेढ्यातही दामाजीपंतांच्या कचेरीत काही दुर्जन होतेच. त्यामध्ये मुजुमदार म्हणून एक प्रसिध्द होते. स्वत:च्या हातून तर एकही चांगले कृत्य कधी व्हायचे नाही, पण दुस-याने चांगले कृत्य केलेले बघवत ही नाही. मुजुमदारांना तहसिलदाराची जागा मिळवायची होती. दामाजीपंताबद्दल दरबारात चुगली केली व बादशहाचा दामाजीपंतावर रोष आला म्हणजे आपणास तहसिलदाराची जागा मिळेल, असे त्यास वाटत होते. त्याने बादशहास गुप्तपणॆ पत्र लिहून, ’दामाजीपंतांनी सरकारच्या परवानगीशिवाय सर्व धान्य लोकाना देऊन सरकारची नुकसानी केली आहे’ असे कळविले. आणि दामाजीपंत हे दरबाराविरुध्द वागतात हे ही कळविले.बादशहा हुमायूनशहा अगोदरच जालीम म्हणून प्रसिध्द आणि त्यात चुगलीची भर. बादशहा क्रोधित झाला. आणि एकदा बादशहाला राग आला कि त्यापुढे महमद गवान सारखा हुशार असलेला दिवान, जायला धजत नसे. बादशहाने ताबडतोब दामाजीपंतांना पकडून आणण्याचा आणि कृष्णाजीपंत मुजुमदार यांना तहसिलदार म्हणून नेमण्याचा हुकूम पाठविला. ताबडतोब चार पठाण घोडेस्वार, एक त्यांचा अधिकारी असे मंगळवेढ्यास निघाले व घोडदोड करीत तीन दिवसात मंगळवेढे तहसिल कचेरीत हजर झाले. जालीम हुमायूनशहा यांने कोणास भेटीस बोलावणे पाठवले की म्हणजे तो पुन्हा परत येत नाही, असा त्यावेळी लोकांनां अनूभव होता. म्हणून भेटीस बोलावणे, जाण्यापूर्वी आपल्या बायका मुलांचां निरोप घेऊनच जात असत. आणि येथे तर दामाजीपंतांना पकडून आणण्याचा हूकूम होता. दामाजीपंत कचेरीत काम करीत होते. त्यांनी तो हूकूम पाहून काय समजायचे ते समजले. कचेरीतील सर्वांचा निरोप घेऊन ते घरी सौ. सावित्रीबाई यांचा निरोप घेण्यास निघाले. हा हा म्हणता ही बातमी मंगळवेढे गावात सर्वांना कळाली. सर्व लोक गंभीर चेहरे करून दामाजीपंतांच्या वाड्यासमोर उभी राहीली. ही बातमी ऎकून सावित्रीबाईला रडू कोसळले. आपण ही दामाजीपंताबरोबर बिदरला जावे असे सावित्रीबाईंना वाटले. पण यावर " अगं, आता या वेळेस बिदरला तू कशाला येतेस, मी जाऊन आल्यावर पुन्हा एकद जाऊं." असे दामाजीपंत म्हणाले.
असे बोलणे चालू असताना, तोच पठाण घोडेस्वार वाड्याबाहेर आले, "अजून तयारी झाली नाही का? लवकर चला. नाहीतर बेड्या ठोकून नेऊ" असे म्हणू लागले. सावित्रीबाई वाड्याबाहेर आल्या व पठाण स्वारांना म्हणाल्या " दामाजीपंत जेवण करीत आहेत. आपणही त्यांचेबरोबर जाणार आहात, तुम्हीही थोडॆ जेवून घ्या." "नाही...होय" म्हणत पठाण घोडॆस्वारांनीही जेवण केले व सर्वांची निघण्याची सिध्दता झाली. दामाजीपंत तहसिलदारासारख्या नोकरीवरील अधिकारी व लढाईतही वाकबगार. पण वाड्याबाहेर येताच "दामाजीपंतांना बेड्या ठोकून व दंडास मुसक्या बांधून आणण्याचा बादशहाचा हुकूम आहे" असे सांगून पठाण घोडेस्वारांनी दामाजीपंतास मुसक्या बांधून घोड्यावर बसून चालण्यास सांगितले. सावित्रीबाईने हे पाहून हंबरडा फोडला व दामाजीपंत आता परत येत नाहीत हे तिला कळून चुकले. आता पुन्हा दामाजीपंत दिसणार नाहीत असे समजून तिने आकांत करण्यास सुरुवात केली. हे दृश्य पाहून सर्व लोक ही हळहळू लागले. कोठारे लुटली म्हणून पंतास धरून घेऊन जात आहेत, ही कल्पना सर्वांना आली. व याची शिक्षा सुध्दा त्यांच्या डोळ्यासमोर आली. सावित्रीबाईनी तरी आता बिदरास बरोबर जाण्याचा हट्टच धरला. दामाजीपंताचे अंत: करण सुध्दा हे दृश्य पाहून हेलावले. सावित्रीबाईची कशी समजूत काढावी, याची पंचाईत त्यांन पडली. संकट काय आहे हे पंतांना कळून चुकले होते, आणि यातच आपण धीर सोडला तर इतरांची काय कथा? म्हणून त्यांनी धीर-गंभीर वृत्ती धारण केली, मनाचा निश्चय केला व ते लोकांना म्हणाले...
"प्रिय नागरिकहो, असे हताश काय होता. मी काय पाप केले नाही अथवा गुन्हा केला नाही. भुकेलेल्या मंडळीना धान्य वाटले आहे. माझा यात स्वार्थ काय होता? परमेश्वराच्या ठिकाणी हा गुन्हा होणार नाही. बादशहाने जरी मला शासन केले तरी पंढरीचा पांडूरंग जो भक्तांचे रक्षण करण्य़ास सदा सिध्द असतो, तो, माझेही रक्षण करील. तुम्ही स्वस्थ चित्ताने घरी जा आणि परमेश्वरचिंतन करा."
सावित्रीबाईजवळ जाऊन दामाजीपंत पुन्हा तिचे सांत्वन करु लागले. पंढरीची वारी ते करीत असत ती न चुकता तिला करण्यास सांगून ’आपण निश्चित परत येऊ, काळजी करू नकोस, परमेश्वरावर विश्वास ठेव’ असे तिला पुन्हा पुन्हा सांगितले. इतक्यात पठाणांनी निघण्याचा इशार दिला. दामाजीपंत मुसक्या बांधलेल्या स्थितीत घोड्यावर स्वार झाले, चार घोडेस्वारांच्या मध्ये त्यांचा घोडा चालू लागला. सावित्रीबाई, पंतांच्या सागण्या प्रमाणे वाड्याच्या दारात उभे राहून, दामाजी जात असलेल्या वाटेकडे तोंड करून उभ्या राहिल्या. बाकी जनता दामाजीपंतांच्या मागे धावत रडत माणनदीपर्यंत आली. दामाजीपंताना नेऊ नका असे ते वारंवार घोडेस्वारांना विनवित होते. पण ती आशा ही मावळली. दामाजीपंतांनी पुन्हा एकदा लोकांना विनंती केली आणि घरी परत जाण्यास सांगितले. जनता व्यथित अंतकरणाने मागे फिरली व दामाजीपंताची स्वारी पंढरपूर च्या दिशॆने चालू लागली. मार्ग चालू असताना दामाजीपंत आत्मिक तळमळीने भक्त वत्सल्य पांडूरंगाचे मनोमन चिंतन करीत होते.\

झाला महार पंढरीनाथ
दामाजीपंतांना तर आता अटक झाली. पण आपल्या भक्ताला बादशहापासून सोडविण्यासाठी खुद्द पंढरपूरचा पांडूरग गेला. तो ही विठू महाराच्या वेशभूषेत. ती कथा अशी आहे..............दामाजीपंतांच्या मामलेदार कचेरीत विठू नावांचा एक महार अतिशय प्रामाणिक नोकर होता. त्याकाळी महसूल महाराकरवी राज दरबारी भरण्याची पध्दत होती. आणि हिच युक्ती पंढरीच्या पांडूरंगाने लडविली. डोकीवर फाटकं मुंडास, मलीन फाटके धोतर, खांद्यावर घोंगडी, पायात वहाणा, व हातात घुंगराची काठी आणि कपाळावर गंधाचा टिळा, असे हे पांडूरंगाचे रुप.
बिदरमध्ये पांडूरंग, विठू महाराच्या रुपात गेले असता, असे म्हंटले जाते की, त्यांनी एक पाऊल बिदरच्या वेशीत तर दुसरे पाऊल चक्क बादशहाच्या दरबारात ठेवले. अचानक प्रकट झालेल्या विठूला पाहून बादशहाच्या वजीराने, आपण कोण? कुठून आलात? आत यायला आपणास कोणी अडवले नाही का? असे प्रश्न केले.
त्यावर विठू महार नम्रतेच्या सुरात व धीर गंभीर होऊन म्हणाले, " मी मंगळवेढ्याच्या दामाजीपंतांचा प्रामाणिक नोकर आहे. मला विठू महार म्हणतात. माझ्या धन्यास (दामाजीपंत) दुष्काळाने झालेले जनतेचे हाल पाहावेनात, म्हणून हुजूर त्यांनी आपल्या ताब्यातील धान्यांनी भरलेली कोठारातील धान्य विकून, असाहाय्य जनतेचे प्राण वाचविले. त्या मोबदल्यात पैशाचा भरणा करण्यासाठी दामाजीपंतांनी मला पाठवले आहे. असे म्हणून विठू महाराने (पांडूरंगाने) कमरेची थैली काढून बादशहाच्या दरबारात अमीर उमराव यांचे समोर उघडी केली तेंव्हा त्यातून खळखळ असा आवाज होत मोहरांचा प्रचंड ढिग लागला. एवढ्या लहानशा पिशवीतून एवढा मोठा मोहरांचा ढिग पाहून बादशहा आ वासून बघत राहिला. अमीर उमराव व दरबारातील सर्व जनता एकमेकांकडे डोळे वासून आश्चर्याने पाहू लागली. लोकांना कळण्याच्या आत पांडूरंगाने पैशाचा भरणा केल्याची पावती मागितली. आणि पावती मिळताच पांडूरंग दरबारातून अदृश्य झाले, ते थेट दामाजीपंत बिदरच्या वाटेवर ज्या ठिकाणी मुक्कामी होते, आणि तेथेच अदृश्य रुपात ती पावती गीतेच्या ग्रंथात ठेऊन पंढरपूरला गेले.
विठू महाराच्या वेशभूषेत, पंढरीच्या पांडूरंगाने बिदरच्या वेशीत ठेवलेले पहिले उजवे पाऊल, तेथे उमटले व ते अजून ही जवळ जवळ ८०० वर्षांनंतर तसेच आहेत. या पाऊलाची रोज सकाळी पूजा केली जाते. दुसरे पाऊल दरबाराच्या घुमट वेशीपाशी आहे तेथे ही ते उमटले आहे व त्याची पण रोज सकाळी पूजा केली जाते. मुसलमानी राजवटीपासून ही पावले तेथे आहेत. असे म्हंटले जाते की ही पावले नष्ट करण्याचा प्रयत्न ब-याच वेळेला केला, पण त्यात यश आले नाही, असे बिदर मधील नागरिक सांगतात.
काशीविश्वेश्वराचे मंदीर :-
मंगळवेढे शहरातील सर्वात जूनी प्राचीन सुंदर वास्तू म्हणून किल्ल्यामागील काशीविश्वेश्वराचे मंदीर असा उल्लेख करता येईल. तेथील मुळचे देऊळ इ.सन. १० व्या व ११ व्या शतकात म्हणजे चालुकय कलचुरीचे उत्तर काळात अथवा यादवांचे अधिपत्याखाली बांधले गेले असावे, कारण देवळाचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीप्रमाणे आहे. यादवोत्तर काळात हे मंदीर मोडकळीस आले होते. पुढे मुसलमानी राजवटीत विजापूरच्या गादीवर आल्ली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी शके १४९४, इ.स. १५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा असून जसाचा तशा न देता सलग देत आहे.शिलालेख
श्री. गणेशायनम: आदौ कर्ता। तर्तो सौंहर्ता तदनंतर जीवाना जठर भर्ची गौरी। भर्ता पुनान तुमाम॥--॥ स्वस्ती श्री जय अभ्युदय शालिवाहन शके १४९४ प्रवर्तनामे ॥ -- ॥ अंगीरस नाम ॥ संवस्तरे दक्षिणायने १) वर्षा ॠतो भाद्रपद मासी शुक्ल पक्ष । तृतिया स्थिरचंद्र वासरे तत्काळे हस्त नक्षत्रे साध्य नाम योगे, तैतिला करणे । धनुलग्ने, अस्मीन पुण्य दिवसी । श्री निजभक्त श्रीमंत भारद्वाज गोत्र, कात्ययन सुत्र, शुक्ल युजू २) शाखा ध्यायचे, लाहयानी धनाजी हिप्परगे कळे येथील कुलकर्णी ॥ विजापूर देशाचे परगणे ॥ मंगळवेढे ॥ यांचे स्थळी. मुन्मू । करिता वेळे कसबे मध्ये । जोगी बावी सान्निधाने जुने देऊळ पडले, ते जिर्णोध्दार करुन, श्री काशीविश्वनाथ लिंग प्रतिष्ठापना करून ३) तिरणभट उपाध्येशी अनगर कराशी देवाची पुजा व अध्यायन सांगावया करणे ठेवले. त्यासी स्वस्ती देसाई हिरॊजी व कसगावडा वा मळशेट्टी होनरावू वा मळकोजी वा आनंद पटेलासी सांगितले. । त्यांने यासो मुठी केला. । प्रजाभागामध्ये चालवू. म्हणून वाक सुकृत दिधले असे. ४) पुढे यासी साक्षी बोयाजी भगरावा तिमाजी सौकळ कुलकर्णी. कसबेचा पुजा. गुरोजी संबंध नाही. त्याने धुपारतीने वेळे मांधळ वाजवून नेवैद्य द्यावा. विडा दक्षिणेसी सबंध नाही. हे वोळासी विळ होवून चौधीरचा नरसो पटेल. अंगीकार असे यासी जो दुसरे कोणी येईल त्याचे वंशवरी गाढव असे. ॥ मुल्ला याकूब काढले असे. तुका कुलकर्णी.
शिलालेख - संकलन
श्री गोविंद रघुनाथ सबनिस.
शालीवाहन १० वे शतकात या मंदीराचे जिर्णोध्दार, भारद्वास गोत्रातील धनाची हिप्परगी यांनी केला. असा शिलालेखाचा उल्लेख आहे. श्री काशिविश्वेश्वर मंदीराचे बांधकाम शालिवाहन ७ व्या शतकात झाले असावे. मंदीरावरील दगडी देव देवतांचे शिल्प फारचे पुरातन काळातील आहेत.

मंदीराजवळील विहीर त्याच वेळी बांधली असावी. कारण शिलालेखात मंगळवेढे यांच्या स्थळी- मुन्मु करता वेळे कसबेच्या जोगी बावी सान्निध्याने जुने देऊळ पडले असा उल्लेख आहे. विहिरीचे बांधकाम सुध्दा अतिशय पुरातन काळातील आहे. विहीरीतीळ देव देवतांच्या मुर्ती जीर्ण झालेल्या आहेत. ( जगातील बह्मदेवाच्या तीन मुर्तीपैकी एक ब्रह्मदेवाची मुर्ती विहीरीतील कमानीत पूर्वाभिमुख बसविली आहे) यावरून मंगळवेढ्याची एतिहासिक परंपरा फार प्राचीन काळातील असावी. ब्रह्मदेवाच्या मुर्तीशेजारी एक भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग मंगळवेढ्याच्या पश्चिमेस कृष्ण तलाव नावाचा एक तलाव आहे. हा तलाव कोणी खोदला याचा पुरावा सापडत नाही. परंतू तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाचे पुरातन असे सुंदर मंदीर बांधले होते. विहीरीतील भुयारी मार्ग या गोपाळ कृष्णाच्या मंदीरापर्यंत आहे. अशी लोक अख्यायिका आहे. ही अख्यायिका सत्य असावी. कारण महाराष्ट्र शासनाने १९७२ साली जो दुष्काळ पडला त्यावेळी कृष्ण तलावाचे उत्खनन केले. त्यावेळी तलावाच्या मध्यभागी गोपाळकृष्णाच्या मंदीराचे जुने अवशॆष मोठमोठ्या शिळा भंगलेले दगडी शिल्प, मंदीराचा चबुतरा पडीक अवस्थेत आहे. अजून त्या ठिकाणी मंदीराचे जुने पडीक बांधकाम पाहवयास मिळते.
मंगळवेढ्याचा भुईकोट :-
राजवाडे, धर्मस्थळे, तीर्थस्थळे यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. त्यात कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेख आहेत. मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे, गैबीसाहेब दर्गा या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या वास्तू.बॉम्बे गॅझेटीअरवरून असे दिसते की, मंगळवेढे गाव पुर्वी तीन भागात विभागले होते. १) किल्ला २) कसबे ३) शनिवार पेठ. पेठ केंव्हा वसली याची निश्चित माहीती नाही. सध्याचे वार्ड क्रं. १ व वार्ड क्रं २ यास कसबे म्हणत होते. त्या कसब्याभोवती इ.स. १६९४ साली गावकूस बांधले. त्याची एकंदर लांबी ६९३६ फूट व रूंदी ८ फूट होती. त्याच्या पुर्वेस बोराळे नाका, नेऋत्येस सांगोला नाका व उत्तरेस बुरुज १२० फूट उंच व १४ फूट व्यासाचा होता, असे चौरंग बुरुज होते. भुईकोट किल्ल इ.स. १४९३ साली बांधला त्याची लांबी उत्तर दक्षिण अंगास १२४५ फूट, पूर्व अंगास १२०० फूट व पश्चिम अंगास ९२० फूट आहे. तट १३ फूट रुंदीचा व ३५ फूट उंचीचा होता. त्यास सात बुरुज होते त्यांची नावे--- मर्दान, करड, चौफाळा, जगभावी, गच्ची,कैकाड आणि बोराळ. सर्वात मोठा बुरुज मर्दान नावाचा असून त्याची उंची ५७ फूट व व्यास ५० फूट आहे. तो सध्याचे लक्ष्मीनारायण देवळासमोर होता. किल्ल्याभॊवती खंदक ८२ फूट रुंद होता. पुर्वेस मुख्य वेस असून ती १४ फूट उंच व १२ फूट रूंद होती. ही चौभुर्जी मुख्य किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी २३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू लागले. सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय. सध्या किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले आहेत. अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात. किल्ल्यात एका कोपर्यात काही कोरलेल्या मूर्ती, सप्त मातृकांची मूर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात.
संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत.चोखामेळांविषयी बऱ्याच आख्यायिका आहेत चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके १२०० साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती.
शके १२६० ला मंगळवेढ्यातील वेशीच्या तटाची भिंत कोसळली होती. व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपूरी आला. आणि त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आले .संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग होते.त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्ती परायण होते. त्या सर्वांचे श्रीविठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते.
त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वत: विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखामेळांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग- रचना आहेत. संत चोखामेळांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत.
संत चोखामेळांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वत:ला ‘विठू पाटलाचा बलुतेदार, म्हणून समजत असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्र्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्रय, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते.
किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखामेळाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखामेळारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी जवळ समाधी बांधली.
त्याचा बाजूलाच लागून पायरायची विहीर आहे. ती आता दुरावस्थेत आहे आणि त्याचा एका कोपऱ्यात ब्रह्माची ३ ते ४ फूट उंचीची मूर्ती आहे. कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला ब्रह्माचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी या ठिकाणी ब्रह्मदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ अस्तित्वात नसले तरी ब्रह्मदेवाची मूर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जगातील मोजक्याच ब्रह्मदेवाच्या मंदिरांपैकी हे एक ठिकाण आहे, राजस्थानातील पुष्करनंतर या ठिकाणी असे ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. संत चोखोबांचा गावकुश अंगावर पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्थी संत नामदेव महाराज पंढरपूरला घेऊन जात असताना शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महादेव मंदिरासमोर त्यांनी विसावा घेतला आणि तेच ठिकाण महादेव मंदिराबरोबर विसाव्याचे ठिकाण म्हणून इतिहासात अधिक परिचित झाले. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची श्रावणात गर्दी मोठी असते.
श्री संत दामाजी महाविद्यालय येथील संग्रहालय :-
मंगळावेढा परिसरात सापडलेल्या अनेक प्राचीन मूर्तीचा संग्रह "श्री संत दामाजी महाविद्यालय" उघड्यावर संग्रहालय केला आहे. मंगळवेढा ते महाविद्यालय अंतर १.५ किमी आहे. मारवाडी गल्ली जेथे बोराळेनाका रोडच्या गल्लीला एकमेकांना जेथे छेदतात, त्याचा २ मिनटं आधी मारवाडी गल्लीत रस्त्यात डावीकडे एक नवीन मंदिर आहे. त्याचा समोर म्हणजेच आपल्या उजवीकडे एक प्राचीन लहान मंदिर/ घरासारखी वास्तू दिसते. तिथे त्या वास्तूच्या बाहेर काही प्राचीन मूर्ती दिसतात आणि एक मूर्ती आणि वीरगळ भग्न अवस्थेत वडाचा झाडाखाली आहे. या ठिकाणाच्या पाठीमागे सांगोल्याला जाणारा रस्ता लागतो. तो पुढे २ मिनिटावर बोराळे नाक्याला मिळतो. तेथून तुम्ही सोलापूरला जाणाऱ्या रस्त्याने गेलात कि ७०० मीटर वर महाविद्यालय आहे.![]() |
महाविद्यालयाचा बाहेरील फोटो आणि पिवळ्या रंगाचा वर्तुळ मध्ये संग्रालयाची जागा दर्शवली आहे
गैबी पीर मशीद :-
किल्ल्याची जबाबदारी राज्य की केद्र शासनाची? हे निश्चित करून किल्ल्याची भिंत 13 फूट रूंद असल्याने त्यावर स्लॅब टाकून किल्ला वरून पाहता येईल अशी व्यवस्था करावी. तालुक्यात विस्कटलेल्या पुरातन मूर्ती एकत्रित जतन केल्यास तालुक्याचा इतिहास पुढील पिढीस माहिती होईल. कारागृह, भूमी अभिलेख, प्रांताधिकाथी, सार्वजनिक बांधकाम या कार्यालयांची दुरुस्ती होते. त्याप्रमाणे ऐतिहासिक किल्ल्याचा ठेवा जपण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे.. शहर व ग्रामीण भागात असलेल्या धार्मिक स्थळांच्या माध्यमातून भाविकांच्या भेटीगाठी दर्शनाच्या निमित्ताने होत असेल तर या धार्मिक स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे आवश्यक आहे
मंगळवेढा शहरातील इतर प्रेक्षणीय ठिकाणे
संत दामाजी मंदिर, संत चोखामेळा समाधी, कान्होपात्रा मंदिर, गणपती मंदिर, भुईकोट किल्ला, कृष्ण तलाव, गैबीसाहेब दर्गा, गोपणबाई विहीर आदी.
खाद्यपदार्थ...
खवय्यांसाठी मंगळवेढ्यातील प्रसिद्ध ठिकाणे : सुगरण, अन्नपूर्णा, राजधानी, रानवारा, स्वाद हे चविष्ट जेवणासाठी तर मस्तानी (आत्माशांत), बासुंदी (सोमनाथ माळी), भेळ (सुनील सोमदळे), रगडा (पिंटू वाकारकर) हे चवदार पदार्थ येथे मिळतात.
१) सोलापुर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थलकाल - अरुण टिकेकर
३) www.trekshitiz.com हि वेबसाईट
४) www.durgbharari.in हि वेबसाईट
५) https://vijaysardehindi.blogspot.com/2019/08/blog-post.html
६)
७) https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-chokhamela/
मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे, गैबीसाहेब दर्गा या इतिहासाच्या खुणा सांगणाऱ्या वास्तू.
पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्ती नंतर किल्ल्यापाठीमागील महादेव विहिरीत आहेत. भारतातील एकमेवाद्वितीय ती ब्रम्हदेवाची मूर्ती सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद काळ्या पाषाणात कोरलेली आहे. त्याशिवाय महिषासूर मर्दिनी, तीर्थकर यांच्या मूर्ती तेथे आढळतात.
जलयुक्त शिवार मोहिमेत या तलावात कृष्णाचे मंदिर आढळून आले. जुन्या काळातील मूर्ती सापडल्या.सापडलेल्या मूर्ती काही संशोधकांनी इतरत्र नेल्या तर काही पालिकेत ठेवल्या.त्या वस्तू एकत्रित करुन वस्तुसंग्राहय उभा करणें गरजेचे आहे.
मंगलवेढ़ा का इतिहास/ Mangalvedha ka Itihas
मंगलवेढ़ा नामक एक प्रमुख तीर्थस्थल पंढरपुर से 21 किमी की दूरी पर है. इस स्थान के नाम की उत्त्पति से संबंधित दो विचार प्रवाह जुड़े हुए हैं. पहले विचार प्रवाह के अनुसार यहाँ राज्य करने वाले ‘मंगल’ नामक राजा के कारण यह नाम पड़ा तथा दूसरे के अनुसार गाँव में स्थित ‘मंगलाई’ माता के कारण इसे ‘मंगलवेढ़ा’ नाम प्राप्त हुआ. यहाँ पर मिलनेवाले पुरावशेष 9-11वीं शताब्दी के भी पीछे तक ले जाते हैं.
चालुक्य, कलचुरी राजवंशों के समय यह एक प्रमुख स्थान था. कुछ समय तक यह प्रदेश देवगिरि के यादवों के अधिपत्य में भी रहा. अंततः लगभग 14वीं शताब्दी में यह बहमनी राज्य का अंग बना रहा. मंगलवेढ़ा में जगह-जगह प्राचीन पुरावशेष बिखरे पड़े हैं.
![]() |
| जैन तीर्थंकर |
![]() |
| बुर्ज के अवशेष, मंगलवेढ़ा |
पंढरपुर, सोलापुर से सरकारी बस-सुविधा उपलब्ध है. नजदीकी रेल-स्टेशन पंढरपुर में है. सोलापुर रेल-स्टेशन भी यात्रियों के लिए सुविधाजनक हैं. (पंढरपुर-26 किमी, सोलापुर-54 किमी, विजयपुरा-87 किमी, कराड- 171 किमी)
प्राचीनकाळी पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसऱ्या मुलाचा या ठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढा नाव पडले असावे, असे जाणकारांचे मत आहे. आठव्या शतकात काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला ब्रह्माचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी या ठिकाणी ब्रह्मदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ अस्तित्वात नसले तरी ब्रह्मदेवाची मूर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जगातील हे ब्रह्मदेवाचे मंदिर असणारे दुसरे ठिकाण आहे, असे मानले जात आहे. राजस्थानातील पुष्करनंतर या ठिकाणी एकमेव असे ब्रह्मदेवाचे मंदिर आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते. संत चोखोबांचा गावकुश अंगावर पडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अस्थी संत नामदेव महाराज पंढरपूरला घेऊन जात असताना शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या महादेव मंदिरासमोर त्यांनी विसावा घेतला आणि तेच ठिकाण महादेव मंदिराबरोबर विसाव्याचे ठिकाण म्हणून इतिहासात अधिक परिचित झाले. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची श्रावणात गर्दी मोठी असते. शहर व ग्रामीण भागात असलेल्या धार्मिक स्थळांच्या माध्यमातून भाविकांच्या भेटीगाठी दर्शनाच्या निमित्ताने होत असेल तर या धार्मिक स्थळाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे आवश्यक आहे
Worship of Lord Brahma, Part 87
BY: SUN STAFF
Lord Brahma, Mangalwedha
May 8, 2018, CANADA (SUN) — A serial exploration of places of Lord Brahma's worship.
Lord Brahma in Mangalwedha
Today we visit the first of a number of Brahma sites in Maharashtra, situated in the town of Mangalwedha in Solapur district. Mangalwedha is approximately 50 km. southwest of the city of Solapur, and 25 km southeast of Pandharpur. Known for being the birthplace of Sri Jayatirtha, the great Dvaita saint and commentator on Sri Madhvacarya's works, Mangalwedha is also home to an ancient Brahma Temple.
Mangalwedha is mentioned as 'Metulingpuri' in the Bhima Mahatmya of Skanda Purana, but some historians question that identification. There are many monumental stone ruins from the Chalukya kings of Kalyani found around Mangalwedha, indicating that it was an important center during the 9th to 11th centuries. Numerous inscriptions give evidence that the town was under the rule of the Chalukyas of Kalyani, later becoming the seat of the Kalachuryas.
Mangalwedha Temple
The Kalachuris migrated to the south from an area that is now known as Hyderabad, and made Mangalwedha (Magaliveda, Mangalavedhe or Mangalavada) their capital. They called themselves Kalanjarapuravaradhisvara, which indicates their origin in central Indian. Beginning as modest feudatories of the Chalukyas of Kalyani, they overthrew the Chalukyas and ruled for a brief period, during the 12th century under the emblem of Suvarna Vrishabha, the golden bull.
According to an inscription referring to the year 1174, the founder of the Kalachuris was Soma, who was a disciple of Ashwathama, of Mahabharata fame. He is said to have grown a beard and moustache to conceal his identify, in order to escape the wrath of Parasurama. Thereafter Soma's family and heirs came to be known as Kalachuris ('kalli' means a long moustache and 'churi' means a sharp knife).
Later records of the Kalachuri dynasty claim that the line descended directly from Lord Brahma, so it is not surprising that we find a temple here dedicated to Lord Brahma.
Mangalwedha Temple
There are a number of other interesting temples located in Mangalwedha, and many shrines scattered throughout the more than seventy villages in the outlying areas. The town's most frequented temples include those dedicated to local saints, Damaji, Chokha, as well as the temples of Vishveshwar Mahadeo.
Mangalwedha
The temple dedicated to the god Vishveshwar Mahadeo is said to have been constructed in 800 A.D. It is a Hemadpanti structure and was renovated in the year 1572 A.D. This temple bears an inscription in Marathi. In the month of Magna, a Mahashivaratri festival is celebrated here, drawing large crowds of devotees.
Vishveshwar Mahadeo Temple
The fort of Mangalvedha was built using materials the leaders took from old Jain temples they demolished, around 1500 A.D.
Mangalwedha Monuments

श्री पांडूरंगाचे बिदरच्या वेशीतील उमटलेले पाऊल
मंगळवेढा किल्ल्याच वर्णन
एसटी
आगार पासून ५ ते १० मिनटात चालत मी किल्ल्याजवळ पोहचलो. रस्त्याला एक
तांदळा स्वरूपातील कुठच्या तरी देवाचं मंदिर लागलं त्यात एका पाषाणावर
नागाची कोरीव शिल्प होता. ते बघून पुन्हा पुढे चाललो. तेथून ५ मिनटात मी
किल्ल्याचा ४ बुरुज आणि ४ भिंतच्या गडी जवळ पोहचलो. आता ते उपविभागीय
दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. त्यात काही मूर्ती आहेत पण पोलीस फोटो
काडून देत नाही कारण त्याचा पाठी कारागृह आहे. मला स्वतः अनुभव आला तरी एका
पोलिसाने फोटो काढून दिले म्हणून बर झालं. आत अजून पाहण्यासारखं काही
नाही.
तेथून बाहेर पडून मी त्या गडीच्या चारी बाजूने फिरलो. गडीच्या
बाजूला एक मंदिर आहे त्याचा बाहेर हि काही मूर्ती आणि शिवपिंड आहे.
गडीच्या पाठी डाव्या बाजूला काशीविश्वेशरचा प्राचीन मंदिर आहे. तिथे हि
अजून काही मूर्त्ती मंदिराचा आवारात दिसतात. तर त्याचा बाजूलाच लागून
पायरायची विहीर आहे. ती आता दुरावस्थेत आहे आणि त्याचा एका कोपऱ्यात
ब्रह्माची ३ ते ४ फूट उंचीची मूर्ती आहे. मी तिथे जाण्याचा प्रयत्न केला
पण दगडी घसरून पडण्याचा भीतीने लांबून फोटो काढला.
मंगळवेढा
प्रकार : भुईकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
भीमा नदीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा संतभूमी म्हणून ओळखली जाते. संत
चोखामेळा, संत दामाजी आणि कान्हापोत्रा यांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव
पावन झालेले आहे. सोलापूर-सांगली रस्त्यावर सोलापूर पासून ५० कि.मी.अंतरावर
मंगळवेढा हे ठिकाण आहे. विजापूरजवळ असल्याने हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात
महत्वाचे होते. आदिलशहाची राजधानी विजापूर व निजामशाहीची राजधानी नगर या
दोन्ही शाह्यांच्या आपापसातील लढाईत मध्यभागी असलेले मंगळवेढा सतत बेचिराख
झाले. मंगळवेढा गावात किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असुन कोरीव स्तंभ,
भग्न मूर्ती, शिलालेख यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले
पाहण्यास मिळतात. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी आता असलेल्या दरवाजासमोर
काही अंतरावर एक सफेद रंगाची जुम्मा मशीद दिसुन येते. मंगळवेढे गावापासून
जवळच माचणूर याठिकाणी इ.स. १६९५ ते १७०२ औरंगजेबाचा मुक्काम असताना औरंगजेब
मंगळवेढे येथील या जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे.
कै.रा.ग.करंदीकर यांच्या १९६०मध्ये छापलेल्या श्री.संत दामाजी महाराज यांचे
चरित्र या पुस्तकात मंगळवेढा किल्ल्याचे वर्णन खालीलप्रमाणे आले आहे.
औरंगजेबचा मुक्काम मंगळवेढ्यापासून नऊ मैलावर माचनुर येथे असता त्याच काळात
मंगळवेढा कसब्याभोवती इ.स.१६९४ साली गावकूस बांधले गेले. त्याची एकंदर
लांबी ६९३६ फूट व रूंदी ८ फूट होती. त्याच्या पुर्वेस बोराळे,नेऋत्येस
सांगोला,व उत्तरेस कासेगाव अशा तीन वेशी होत्या. या वेशीमध्ये १२ फूट उंच व
१४ फूट व्यासाचे चौदा बुरुज होते. १५ व्या शतकात मंगळवेढ्यात अनेक जैन
मंदिर होती. ती मंदिरं उद्ध्वस्त करून त्याच्या अवशेषांचा वापर करून
बिदरच्या मुसलमानी राज्यकर्त्यांनी सात बुरुजांचा आतील भुईकोट किल्ला इ.स.
१४९३साली बांधला. त्याची लांबी उत्तर दक्षिण अंगास १२४५ फूट, पूर्व अंगास
१२०० फूट व पश्चिम अंगास ९२० फूट आहे. तट १३ फूट रुंदीचा व ३५ फूट उंचीचा
होता. त्यात असलेल्या सात बुरुजांची नावे अनुक्रमे मर्दान, करड, चौफाळा,
जगभावी, गच्ची,कैकाड आणि बोराळ अशी होती. यातील सर्वात मोठया मर्दान
बुरुजाची उंची ५७ फूट व व्यास ५० फूट होता व तो लक्ष्मीनारायण देवळासमोर
होता. किल्ल्याभॊवती खंदक ८२ फूट रुंद होता. पुर्वेस मुख्य वेस असून ती १४
फूट उंच व १२ फूट रूंद होती. इ.स. १७०० नंतर मोगल अंमल संपून हा किल्ला
मराठ्यांच्या ताब्यात आला. छत्रपती शाहू महाराज यांनी राजे पांढरे यांना
प्रमूख नेमले. इ.स. १७०८ ते १७४२ पर्यंत त्यांचा अंमल असताना त्यानी सध्या
उभी असलेली चौबुर्जी इ.स. १७२० ते १७३० पर्यंत बांधली. ही चौबुर्जी मुख्य
किल्ल्यातील आतील बालेकिल्ला आहे. तो चौकोनी असून प्रत्येक बाजूची लांबी
२३० फूट आहे. भिंत १८ फूट उंच असून ८ फूट रूंद आहे. त्यास रणमंडळ रहाट, भूत
व बडेखान असे चार बुरुज असून ते २५ फूट उंच व ३० फूट व्यासाचे आहेत. तटाचे
रणमंडळ बुरुजावर तास वाजवित असत म्हणून त्या बुरुजास तास बुरुज असे म्हणू
लागले. सध्या करंदीकर वकील राहतात त्यांच्या घराजवळील हा रणमंडळ बुरुज होय.
वरील वर्णन पहाता किल्ल्याला एकुण तिहेरी तटबंदी असल्याचे दिसुन येते. आता
आपल्याला पहायला मिळणारी वास्तू म्हणजे मुख्य किल्ल्याच्या अंतर्गत असणारी
किल्लेवजा गढी असुन त्याला चार मातीचे बुरुज आहेत. किल्ल्याचे क्षेत्रफळ
एक एकर असुन सध्या किल्ल्यात तलाठी कचेरी, पोलीस चौकी आणि उपविभागीय
दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्यात असणाऱ्या कार्यालयामुळे
किल्ल्याचे दोन भाग पडले असुन किल्ला पहाण्यासाठी दोन वेगवेगळ्या वाटांनी
आत जावे लागते. आपण आत शिरतो तो किल्ल्याचा दरवाजा अलीकडच्या काळात
बांधलेला असुन किल्ल्याचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे जो दगडांनी चिणून
बंद केला आहे. तटबंदी व बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजूने दोन ठिकाणी
पायऱ्या आहेत. किल्ल्याचा तट आजही मजबूत असुन त्याचे दुमजली बुरुज मात्र
ढासळत चालले आहेत. यातील पुर्व बाजुंच्या बुरुजाचे बारकाईने निरीक्षण केले
असता त्यांना कधीकाळी पाकळ्यांचा आकार असल्याचे दिसुन येते. किल्ल्याच्या
भोवती असणारा खंदक पुर्णपणे नष्ट झालेला आहे. किल्ल्याच्या आत मोकळ्या
जागेत काही जैनदेवतां मूर्ती, नागशिल्पे, मंदिराचे कोरीव खांब आणि एक
विश्वेश्वराचा मुखवटा नजरेस पडतो तसेच तटबंदीच्या एका कोपऱ्यात काही
कोरलेल्या मूर्ती,सप्तमातृका व गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. किल्ल्यात
असणाऱ्या कार्यालयांमुळे आत मुक्तपणे फिरता येत नाही. मंगळवेढे शहरातील
सर्वात प्राचीन वास्तू म्हणजे किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले
काशीविश्वेश्वराचे मंदीर. कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी असता
त्यांनी या मंदिराची निर्मिती आठव्या शतकात केली. होती. ते स्वत:ला
ब्रम्हाचे वंशज मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले
असावे. मंदिरातील शिलालेखात १५७२ साली या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा
उल्लेख आढळतो. यादवोत्तर काळात मोडकळीस आलेले हे मंदीर पुढे विजापूरच्या
गादीवर अली अदिलशाह असताना हिप्परगीचे श्री. बाहयानी धनाजी कुलकर्णी यांनी
इ.स.१५७२ साली मंदीराचा जिर्णोध्दार केला. याची हकीकत रंगशिळेच्या डावीकडील
खांबावर पाच भागात कोरली आहे. मुळ लेख ६० ओळीचा असून शालीवाहन १० वे शतकात
या मंदीराचे जिर्णोध्दार, भारद्वाज गोत्रातील धनाजी हिप्परगी यांनी केला
असा शिलालेखात उल्लेख आहे. मंदीरावर देव देवतांचे शिल्पे कोरलेली आहेत.
मंदिराच्या आवारात एक दुभंगलेली विरगळ दिसुन येते. मंदीराजवळील विहीर हि
मंदिर बांधकामावेळी बांधली असावी. काही पायऱ्या उतरल्यावर विहीरीत दिसणारी
ब्रम्हदेवाची मुर्ती हि पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्तीनंतर भारतातील
दुसरी ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. हि मूर्ती सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद
काळ्या पाषाणात कोरलेली आहे. याशिवाय तीर्थकर, महिषासूरमर्दिनी यांच्या
जीर्ण झालेल्या मूर्ती तेथे आढळतात. ब्रह्मदेवाच्या मुर्तीशेजारी एक भुयारी
मार्ग आहे. हा भुयारी मार्ग मंगळवेढ्याच्या पश्चिमेस कृष्ण तलावाच्या
मध्यभागी असलेल्या गोपाळ कृष्णाच्या मंदीरापर्यंत आहे असे सांगितले जाते.
गावातील महाविद्यालया जवळ प्राचीन मंदिराचे कोरीव दगड,खांब, वीरगळ पाहायला
मिळतात. संपुर्ण मंगळवेढा फिरण्यास दोन ते अडीच तास लागतात. मंगळवेढा
गावाची ऐतिहासिक परंपरा फार मोठी आहे. मंगळवेढा प्राचीनकाळी मंगलवेष्टक,
महामंडलेश्वर अशा नावांनी प्रसिद्ध होते. पूर्वीच्या शिलालेखावरून
मंगळवेढ्याचा इतिहास इ.स. ४-५ व्या शतकापर्यंत जातो. एक हजार वर्षांपूर्वी
हे गांव राजधानी असून त्यावर कल्याणीचे चालुक्य घराण्यातील सम्राटांचा अंमल
होता. इ.स. १०६० ते ११२१ पर्यंत या गांवी राष्ट्रकुटांचे उत्तराधिकारी
कलचुरी घराण्याचे राज्य होते व मंगळवेढा राजधानी होती. वीरशैव पंथाचे
संस्थापक श्री बसवेश्वर हे कलचुरी राज्याचे मुख्य प्रधान होते. म्हसवड,
तेर, अक्कलकोट येथील शिलालेखांतून कलचुरी राजसत्तेत महामंडलेश्वर राजधानी
असल्याचे उल्लेख आहेत. देवगिरीचे यादव वंशातील राजा भिल्लम याने मंगळवेढे
येथील कलचुरी घराण्याचा शेवटचा राजा बिल्हण याचा इ.स.११९१ मध्ये पराभव
केला. देवगीरीच्या यादव घराण्याचा बहामनी सुलतानाने पराभव केल्यावर
मंगळवेढे बहामनी राज्यात सामील झाले. बहामनी राज्याचे वेळीच इ.स. १४५८
मध्ये दामाजीपंत मंगळवेढ्यात महसूल अधिकारी असताना प्रचंड दुष्काळ पडला अशा
वेळी दामाजीपंतांनी सरकारी धान्य कोठारं जनतेसाठी खुली केली. त्याकरीता
बादशहाने त्यांना कैद केले असता दुसऱ्या दिवशी साक्षात पांडुरंग विठु
महाराचे रुप घेऊन दरबारी गेले आणि दान दिलेल्या धान्याइतकी रक्कम अदा करून
दामाजीपंतांची सुटका केली. नंतर मोगल सरदार बहादूर जिलाणी याने मंगळवेढे व
आसपासचा मुलूख जिंकल्याने इ.स. १४६५ ते १४७५ पर्यंत मंगळवेढे दिल्लीचे मुघल
अंमलाखाली होते. इ.स. १४९३ मध्ये मंगळवेढे येथे भुईकोट किल्ला बांधला गेला
व हे एक प्रमुख व मजबूत लष्करी ठाणे म्हणून प्रसिध्द झाले. ता. ५/११/१४९४
रोजी बिदरचा बादशहा महबूबशा यांने स्वारी करून बहादूर जिलाणीचा पराभव केला व
त्यास ठार मारून मंगळवेढे आपल्या ताब्यात घेतले. अकबराचा सरदार मीर
जयाउद्दीन मुस्ताफाखान मंगळवेढ्यास इ.स. १६०३ मध्ये रहात होता. इ.स.१६६५
साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत आदिलशाही विरुध्द
मोहिम काढली. फलटण, नाथवडा असा आदिलशाही मुलूख जिंकून मुघल सैन्याबरोबर
शिवाजीराजे १९ डिसेंबरला मंगळवेढा किल्ल्याजवळ पोहोचले. त्यावेळी विजापूरचा
सरदार सर्जाखान व नेताजी पालकर यांची या किल्ल्याकरिता लढाई झाली व
नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला. २० डिसेंबर १६६५ रोजी मिर्झाराजे
शिवाजीराजे यांनी मंगळवेढा किल्ल्यास भेट देऊन पाहणी केली आणि तळावर परतले.
मिर्झाराजेंनी मुघलांतर्फे सरफराज खान यास किल्लेदार म्हणून नेमले. हा
किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे
मिर्झाराजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली
होती. २४ डिसेंबर १६६५ रोजी शिवाजीराजे यांची फौज विजापुरी फौजांवर चालून
गेली. उभय सैन्यात युध्द झाले पण ते निर्णायकी नव्हते. विजापुरी सेनापती
सर्जाखान याने थेट मंगळवेढा किल्ल्यावर हल्ला करून किल्लेदार सरफराज खान
याच्यासह त्याच्या पुत्रास व जावयास ठार मारले. या मोहिमेचा शेवट
होण्यापूर्वीच शिवाजीराजांनी ११ जानेवारी १६६६रोजी मिर्झाराजांच्या
परवानगीने पन्हाळ्याकडे कूच केले. यावरून १९ डिसेंबर १६६५ ते ११ जानेवारी
१६६६ या काळात शिवाजीराजे मंगळवेढा परीसरात होते. इ.स.१६६६ साली मंगळवेढे
किल्ला आदिलशहाच्या ताब्यात गेला. इ.स. १६८६ साली मोगलांनी आदिलशाही नष्ट
केली आणि मंगळवेढा मोगलांच्या ताब्यात आले. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या
मृत्यूनंतर ते मराठयांच्या ताब्यात आले. छत्रपती शाहू महाराज यांनी
नेमलेल्या राजे पांढरे यांचा इ.स.१७०८ ते १७४२पर्यंत मंगळवेढ्यावर अंमल
होता. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाल्यावर मंगळवेढा किल्ल्याचे
महत्व कमी झाले. इ.स.१७४२ ते १७५० पर्यंत येथे पंतप्रतिनिधीचा अंमल असून
यमाजी शिवदेव हे येथे सरदार होते. नंतर गोविंद हरी पटवर्धन यांच्या
सरंजामांत हा किल्ला इ.स. १७५१ साली दिला गेला. पटवर्धनाचे मिरज व मंगळवेढे
हे दोन महत्त्वाचे किल्ले होते. इ.स.१७६३ मध्ये निजाम पंढरपूर लुटण्यास
आला असता मंगळवेढे येथील पटवर्धनांनी निजामास परत जाण्यास भाग पाडले. इ.स.
१८०८ पर्यंत मंगळवेढे हे पटवर्धन घराण्याकडे होते. इ.स. १८०८ मध्ये पटवर्धन
घराण्याच्या वाटण्या होऊन मंगळवेढे तालूका चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीकर
पटवर्धन यांचे वाटणीस गेला. १८१८ मध्ये मंगळवेढयाहून तीस मैलावर असलेल्या
अष्टी गावी मराठा व इंग्रज यांची शेवटची लढाई होऊन यात पेशव्याचे सेनापती
बापू गोखले हे धारातिर्थी पडले व मराठा साम्राज्य लयास गेले. चिंतामणराव
आप्पासाहेब नंतर श्रीमंत धुंडीराज तात्यासाहेब हे सांगली संस्थानाचे अधिपती
झाले. त्यांचे कारकार्दीत सांगली संस्थानाचा कारभार काही वर्षे ब्रिटीश
सरकारखाली होता. इ.स. १८७६ पर्यंत हा किल्ला मजबूत व शिल्लक होता. सांगली
संस्थानात ब्रिटीश मुखत्यारी आली असता कॅप्टन वेस्ट यांनी किल्ल्याचे
दरवाजे तर मेजर वॉलर याने तट पाडला. तटाची माती व दगड लोकांनी नेली व
खंदकही बुजवला गेला. काही बुरुज पडले काही बुरुज मुद्दाम पाडले गेले.
© Suresh Nimbalkar
मंगळवेढा (Mangalwedha) किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर
पासून ५० किमीवर सोलापूर-सांगली रस्त्यावरील मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण
आहे. चालुक्य,कलचुरी घराण्याची राजधानी काही काळ या ठिकाणी होती.
विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात
महत्वाचे होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने
मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. मंगळवेढा गावात आता किल्ल्याचे फ़ारच थोडे
अवशेष उरलेले असले तरी, अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत.
सोलापूरचा किल्ला, मंगळवेढा किल्ला आणि माचणूर किल्ला, सिध्देश्वर मंदिर
(माहिती साईटवर आहे) दोन दिवसात सहज पाहून होतात.
इतिहास :
प्राचीनकाळी
पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसर्या मुलाचा याठिकाणी तळ होता.
त्याच्या नावावरून गावास मंगळवेढे नाव पडले असावे. आठव्या शतकात
काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली असे मानले जाते.
त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला
ब्रम्हाचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ
बांधले असावे. आज देऊळ नष्ट झाले असले तरी ब्रम्हदेवाची मुर्ती आजही
आपल्याला पाहायला मिळते.
आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेढ्याच्या जवळ
आहे. इसवीसन १६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांचे सोबत
आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला.
हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे
मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली
होती. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. इसवीसन १६८५
मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला मंगळवेढा किल्ला ताब्यात
घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे. त्याला चार सुस्थितील मातीचे बुरुज आहेत. सध्या किल्ल्यात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात.
किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत. मंदिर परिसरातील शिलालेखात १५७२ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. विहिरीची रचना सुंदर आहे.काही पायर्या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.
गावातील कॉलेज जवळ प्राचीन मंदिराचे कोरीव दगड,खांब, वीरगळ पाहायला मिळतात.
पोहोचण्याच्या वाटा :
मंगळवेढा हे सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणाहून ५० किमी आणि पंढरपूर पासून २३ किमी अंतरवर असल्याने दोन्ही ठिकाणावरुन बसची उपलब्धता आहे.
राहाण्याची सोय :
मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने राहण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी सोबत बाळगावे










































.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)

































No comments:
Post a Comment