
विजयसिंहराजे निर्दोषपणे मरण पावले आणि त्यांचा धाकटा भाऊ जयसिंहराजे त्यांच्यानंतर गादीवर आला, जयसिंहराजे यांना कोणताही पुरुष मुद्दा नव्हता .संयुक्ताराजे आणि सुनीताराजे या त्यांच्या दोन मुली अक्कलकोट राज्याच्या फक्त दोन कायदेशीर वारस आहेत. भारतात एकल पालक दत्तक कायदा पास झाल्यानंतर, संयुक्तराजे भोसले यांनी कुर्ला कुटुंब जिल्हा सातारा येथील मनाजी राजे भोसले यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव मालोजी तिसरे ठेवले.
इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोट मध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही. संस्थातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.
या घराण्यातील श्रीमती निर्मलाराजे भोसले या १९५२ पासून मुंबई विधानसभेच्या सदस्य, १९५६ ते १९६० पर्यंत शिक्षण खात्याच्या उपमंत्री आणि १९६२ ते १९६५ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण खात्याच्या मंत्री होत्या.
अशा या वैभवशाली पराक्रमी आणि शूर घराण्याच्या कामगिरीची अगदी अलीकडेसुद्धा प्रचिती येते. अक्कलकोटमध्ये जुना राजवाडा, नवीन राजवाडा, जलमंदिर, उत्तम शस्त्रागार, धर्मशाळा, उद्यान, रस्ते, वीज, शिक्षण या सर्वच बाबतीत या घराण्याचे योगदान विशेष आहे.
१७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले
१७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले
१७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले
१८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले
१८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले
१८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले
१८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले
१८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह(तिसरे) भोसले
१९२३-१९५२ - विजयसंहराव भोसले
१९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले

अक्कलकोटचा भुईकोट :-
अक्कलकोटचा भुईकोट हा प्रचंड मोठा आहे. त्याचे प्रवेशद्वार एकदम भव्य आहे. आतमध्ये मोठ्या राजवाड्यासारख्या वास्तू आहेत पण त्या मोडकळीस आल्या आहेत. भुईकोटाच्या दुसऱ्या बाजूस शाळा आहे. श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला, अक्कलकोट. शाळेच्या परिसरात नरसिंहाचे शिल्प आढळते. याशिवाय रतीमदन व नंदी यांचे शिल्प पाहावयास मिळते. अजस्त्र अशी तोफ आहे. भुईकोटाची तटबंदी आणि बुरूज आजही भक्कम स्थितीत आहेत.मात्र बराचसा भाग धोकादायक झाल्यामुळे वाड्याच्या आत पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही.
अक्कलकोट पॅलेस राजपूत, मुघल आणि मराठा स्थापत्य शैलींचे विस्मयकारक संमिश्रण दाखवते. राजवाड्याचे गुंतागुंतीचे कोरीवकाम, सुशोभित कमानी, भव्य घुमट आणि उत्कृष्ट भित्तिचित्रे त्याच्या भिंती सुशोभित करतात आणि पर्यटकांना मंत्रमुग्ध करतात. त्याची सममितीय मांडणी, प्रशस्त अंगण आणि विस्तृत बागा त्याचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवतात, राजवाड्याचे ऐश्वर्य आणि भव्यता भेट देणार्या इतिहासप्रेमींना पूर्वीच्या काळात पोहोचवतात.

कट्यारी, बिचवे, कुकरी, कोयते, भाले, बाण, गुप्ती, अंकुश, परशू अशी शत्रूच्या रक्ताला चटावलेली हत्यारे एकेक करत पुढे येऊ लागतात. अचानक उघडणारी दुधारी कट्यार, शत्रूवर फेकले जाणारे सुरे, वेध घेणारे बाण, धावत्या घोड्यावरून मारा करण्याचे भाले, हत्तीवरील ‘अंकुश’, जडावातील खंजीर-कट्यारी असा सारा हत्यारांचा मामला प्रेक्षकास सामोरा येऊ लागतो. त्यांच्या अधे-मधे बचाव करणारी चिलखते, शिरस्त्राण, जिरेटोप, अंगरखा आणि त्या ढाली यांचे सुरक्षाकवचही दिसते.

हत्यारांची दालने जातात आणि पुढच्या दालनात हत्यारांनीच वेध घेतलेल्या शिकारी प्रेक्षकास दिसू लागतात. वाघ, बिबटे, अस्वल, गवा, तरस, रानडुक्कर आणि तेथील सांगवी तलावातील मगरी... या शिकारी तेथे पेंढा भरून ठेवलेल्या आहेत.
शिकारीनंतंरच्या पुढच्या काही दालनांमधून बंदूक-तोफांचे आवाज निघू लागतात. देशी-विदेशी, इतिहास-वर्तमानातील अशा असंख्य बंदुका त्यांची उत्क्रांतीची कथा सांगू लागतात. ठासणी, तोड्या, केप, रायफली, किराबीन, पिस्तूल, संगिनी अशा वेगवेगळ्या जातींच्या बंदुका, प्रत्येकीचा आकार, रंग-रूप आणि सावज निराळ्या टप्प्यांतील. तळहातावर बसेल अशा पिस्तुलापासून ते बारा फूट लांबीच्या बंदुकीपर्यंतचा तो सारा प्रवास! पंचधातूच्या, उखळी, छोट्या-मोठ्या आकारातील तोफा आणि पहिल्या महायुद्धात वापरलेल्या मशिनगन्स देखील तेथे दिसतात.
संग्रहालयात ऐतिहासिक भांडी, मौल्यवान-शोभेच्या वस्तू, खेळणी असा अन्य संग्रहही आहे. संस्थानच्या राजांची तैलचित्रे आहेत. सर्वत्र दिसणाऱ्या सिंहासनाऐवजी हत्तीच्या पायापासून बनवलेले आगळेवेगळे ‘गजासन’ तेथे आहे. अक्कलकोट संस्थानच्या वंशजांकडून त्या साऱ्या ऐतिहासिक ठेव्याचे पिढ्यान् पिढ्या जतन केले जात आहे. सध्या ती जबाबदारी श्रीमंत राजकुमारी संयुक्ताराजे भोसले आणि श्रीमंत राजकुमारी सुनीताराजे भोसले पार पाडत आहेत.
ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू या त्या त्या काळा-वेळाचे दर्शन घडवतात. कधी काळी बांधलेला हा अक्कलकोटचा राजवाडा आणि त्यातली ही जुनी ऐतिहासिक हत्यारे पाहताना हाच अनुभव येतो. शस्त्रांचा हा खणखणाट सतराव्या शतकातील रणभूमीवर घेऊन जातो. यामुळे श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाने भक्तिरसात बुडालेले मन शस्त्रागारातून बघताना इतिहासातही चिंब भिजून जाते.
(अक्कलकोट शस्त्रागार - अक्कलकोट, सोलापूर. हे संग्रहालय आठवड्यातील सर्व दिवस नाममात्र दरात खुले आहे. संपर्क दूरध्वनी : ०२१८१-२२०२२३)
श्री क्षेत्र अक्कलकोट
अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे.
सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले.
अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर
क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण
पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे
स्वामी आज हि येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे.
श्री वटवृक्ष मंदिर
अक्कलकोट (सोलापूर, महाराष्ट्र)-
अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्दपुरुष
होते. पंजाब राज्यात पानिपत जवळ छेलीया खेडेगावी गणेश मंदिराजवळ जमीन
दुभंगून अष्ट वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीने लगेचस्वामी समर्थ
हा मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळीवनात जाऊन ३०० वर्षे
तपश्चर्या केली. ३००वर्षे तप करतांना त्यांच्या अंगावर वारुळ निर्माण झाले.
एका लाकूड तोड्याने झाडतोडतांना त्याच्या कुरहाडीचा घाव स्वामींच्या
मांडीला लागला. त्यामूळे त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोक
कल्याणासाठी कर्दळीवनातून बाहेर पडले. फिरत फिरत स्वामी १८४४ साली
मंगळ्वेढ्यास आले. तेथे बारा वर्षे राहून चैत्र शुध्द द्वितीया १८५६ साली
अक्कलकोटला आले. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे
समाधी काळपर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे.
त्यांचे वास्तव्यनेहमी वटवृक्षाच्या खालीच असे. त्यावेळचे इंग्रजपत्रकार व
इतिहासकार जनरल अल्कार्ट हे अक्कलकोटला आले असता त्यांनी स्वामींचे दर्शन
घेऊन ब्रिटन मध्ये गेल्यावर असे जाहीर केले की, आजच्या काळात प्रभू येशू
पहावयाचे असेल तर ते अक्कलकोटला आहे. स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन
१८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजतासमाधी घेतली.
अक्कलकोट हे सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. सोलापूरहून
अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व
अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
वटवृक्षस्वामी महाराज ट्रस्ट,
अक्कलकोट, जि. सोलापूर
परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य भक्तशिरोमणी संजीवन योगी श्रीमद सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज विरचित
“भजनानंद लहरी अभंग” मध्ये आपल्या स्वामी भक्तांना सांगतात;
जारे जारे जारे अक्कलकोटीं जारे ।। साधोनियां घ्यारे आपुल्या हीता ।। १ ।।
यारे यारे यारे मनोभावें यारे ।। शांतिसुख घ्यारे पायांपाशीं ।। २ ।।
घ्यारे घ्यारे घ्यारे स्वामीनाम घ्यारे ।। दूर होती फेरे चौऱ्यांशीचे ।। ३ ।।
न्यारे न्यारे न्यारे शुद्ध भाव न्यारे ।। मेळउनी घ्यारे मोक्षपदा ।। ४ ।।
आनंद म्हणे तरी सोय दवडू नका ।। सांगतसे सुखालागीं तुमच्या ।। ५ ।।
अक्कलकोट मोक्षधाम !
अमरकोट भलें अक्कलकोटा नांव । जेथे स्वामीराव वसतसे ॥१॥
अद्भूत चमत्कार दाखविले दृष्टीं । तोचि जगजेठी-विश्वपाळ ॥२॥
जाऊनियां तेथे रूप तेचि पाहावें । सेवेसी लागावें, मनोभावें ॥३॥
नरनारी तुम्हीं हेचि काम करा। मनोरथ पुरा होय येणें ॥४॥
स्वामीसुत म्हणे अमरकोट गांव । शोभतसे नांव स्वामीसत्तें ॥५॥
आजच्या आपल्या अभंगाद्वारे श्री स्वामीसुत महाराज अक्कलकोट भूमीचे महत्व
प्रतिपादन करत आहेत. अक्कलकोट हेच मोक्षधाम आहे ! हे समजावून सांगतानाच
मोक्षाचे रहस्य उलगडून सांगत आहेत. स्वामीसुत सांगतात, या भूतलावर परब्रह्म
भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोट हे एकमेव
मोक्षधाम बनले आहे. त्यामुळे या अक्कलकोटाला अमरकोट हे नाव शोभून दिसते. जो
अक्कलकोटी येऊन, स्वामी चरणी विसावतो तो अमर होतो, तो मोक्षाचा धनी होतो.
जगात इतरत्र मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना कराव्या
लागतात. अनेक खडतर असे अनुष्ठान करावे लागतात. पण अक्कलकोट हे भूतलावरील
एकमेव असे ठिकाण आहे, येथे केवळ स्वामी दर्शनाने मोक्ष प्राप्ती होते. येथे
येणारा प्रत्येक जीव हा अमर होतो. म्हणून अक्कलकोट हे अमरकोट आहे. असे
स्वामीसुतांना वाटते.
अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष ८४ योनींचा फेरा चुकवून
अमरधामाला प्राप्त होतो. एवढे श्रेष्ठत्व या गांवाला स्वामी सत्तेने
प्राप्त झालेले आहे. तेव्हा आपण आपला उध्दार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट
जवळ करावे, असा संदेश स्वामीसुत देतात.
सज्जनहो, पुर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या २३
वर्षांच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र आणि पावन झाली आहे. तेथील
चराचरात आणि मातीच्या कणांकणात स्वामींचे चैतन्य भरलेले आहे. तेथिल
प्रत्येक घर आणि प्रत्येक मंदिर हे स्वामींच्या लीलेचे साक्षीदार आहेत.
तेथील वटवृक्ष मंदिरातील महाकाय वटवृक्ष हा सुध्दा स्वामींच्या अस्तिवाची
साक्ष देत उभा आहे. याच वडाच्या झाडाखाली परब्रह्म विराजमान होत असे, या
वृक्षाचे भाग्य ते केवढे थोर म्हणावे, जेथे परब्रह्म विसावा घेत असे. आज हे
वडाचे झाड स्वामींच्या अस्तिवांचे आणि अगाध शक्तींचे गुणगात गात दिमाखाने
डौलत उभा आहे. तेव्हा आपण आपल्या जीवनाचे सार्थक करुन घेण्यासाठी अथवा
मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अक्कलकोटी जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक
व्हावे. स्वामींच्या दारातील चरण धुली आपल्या मस्तकी धारण करावी. या
वटवृक्षाखाली ध्यान करावे, याने आपला हा नरदेह सत्कार्या लागेल. आपला जन्म
मरणाचा फेरा चुकेल. स्वामी कृपेने आपण ही अमरधामाचे वाटेकरी होऊ आणि
जीवनमुक्त होऊन स्वामींच्या सहवासात स्वामी लोकांत स्थान प्राप्त करून घेऊ.
अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने झाल्याचे
दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका,
शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही
आहे. या परिसरात प्रवेश करताच मन स्वामीचरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक
लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात
स्वामींच्या पादुका आहेत त्याला कांन लावल्यावर अनेक वादयांचे आवाज येतात
असा भक्तांचा अनुभव आहे. स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता
पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता. अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही
या ठिकाणी येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही
सकाळी अभिषेक, रुद्रापठण चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथेच
मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक
प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते. जवळच संस्थानचे ऑफिस आहे. भक्त
द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात. सदर ट्रस्ट मार्फत येथे
मंदिरालगत भक्त निवासाची व्य वस्था आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत
असे भक्तनिवास ५-६ इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे. तेथे
छोटेखानी उपहार गृह आहे. येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात
स्वामींच्या जीवनदर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. त्यातील काही फोटो
अचम्बीत करतात. येथेही स्वामींची एक मूर्ती आहे. येथे पार्किंग व राहण्याची
उत्तम सोय आहे.
वटवृक्ष मंदिर अक्कलकोट
अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदीरात पोचल्यावर श्रीस्वामी महाराजांची शांत मूर्ती पहिल्यावर भान विसरायला होत. माणसाचे अहंभाव आपसुक गळूनपडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्यअसते, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रु तरळतात. ही कोणती शरणागती असते जी देताना राग लोभ मत्सर मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते, कळतनाही. असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकवून आपले सुख दुःख, पाप-पुण्य, सारे मनोगत, मनोरथ सांगून टाकावे.बालहट्ट हट्ट धरावा. रुसावे-फुगावे, लाड करवून घ्यावे! स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन् तास पारायणाला बसतात. रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनीही गाभार्यात पोचल्यावर शांत होतात! खरच, स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होवून आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे!
“जे अनन्य भावाने मला शरण येतात, त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो.”
स्वामी नाम सदा मुखी वसो. स्वामी कमलचरणी मम नित्य प्राणविसावा मिळतो.
स्वामी कमलचरणी विसावुन तरी पाहा तुम्ही सर्व प्रचिती येतसे स्वामी अभय वचनाची
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
समाधी मठ
चोळप्पाचे निवासस्थान व नंतरचे समाधी स्थान हे बुधवार पेठेत आहे हा जुने
खानी वाडा सध्या नूतनीकरण चालू आहे. जवळच स्वामींनी पुनर्जीवित केलेली
विहीर, स्वयंभू गणपती, स्वामींचा दंड, पादुका या प्रासादिक वस्तू येथे
दर्शनास उपलब्ध आहेत. दररोज सकाळी येथे पूजा, अभिषेक, लघुरुद्र, महापूजा इ.
धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करतांना दिसतात.
अभिषेकानंतर समाधी वस्त्रांनी पुसून त्यास सोवळे व करवतकाठी उपरणे
पांघरतात. समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेऊन त्यावर फुलांची आरास करतात. हे
दृश्य अतिशय नयन मनोहर असते. प्रदक्षणा करून नमस्कार करताना स्वामींच्या
प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो हे मात्र नक्की. स्वामींच्या काळा पासूनच
या वास्तूला महत्व आहे.
गुरूमंदिर
स्वामींच्याच काळात स्वामींनी माळ चरणपादुका वदंड देऊन त्यास स्वतंत्र
मठ काढण्यास सांगितले. तोच बाळप्पा मठ किंवा गुरूमंदिर होय. या मंदिर
परिसरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते. येथेही मोफत भोजनप्रसादाची
व्यवस्था आहे. प्रासादिक वस्तूंची स्पंदने सदभक्तांना जाणवतात. वटवृक्ष
मंदिराचे जवळच अन्न छत्र आहे. येथे भक्तांसाठी दोनिही वेळी भोजन प्रसादाची
सोय आहे. भक्त येथे ऐछिक द्रव्य दान करून अन्नदानाचे पुण्य प्राप्त करू
शकतात, किंवा देणगी देऊन वर्षातील एक दिवस अन्नदानाचे घेऊ शकतात.
अक्कलकोट जवळच श्री गजानन महाराजांची शिवपुरी आहे. तेथील पुरोहित सकाळ
संध्याकाळ अग्निहोत्र करतात. व त्याचा प्रसारही करतात. या स्थानास
आंतरराष्ट्रीय महत्वही प्राप्त झालेले आहे.
अक्कलकोटचे आणखीन एक वैशिष्ठ म्हणजे भोसले राजघराण्याचे एक मोठे शास्त्रागार येथे प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवले आहे. स्वामींचे एक भक्त राजेरायन यांचा एक मठही अक्कलकोट मध्ये आहे. येथील पादुकाही स्वामींनीच दिल्यात असे सांगितले जाते.
धन्य ती ब्रम्हांडनायकाची नागरी !
श्री स्वामी समर्थांच्या मठांविषयी
परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज इ. स. १८५६ मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळीइ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती. असंख्यवीरांना भारतमातेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करताना इंग्रजांच्या अमानुष छळाला (फाशी,जन्मठेप, हत्याकिंवा तोफेच्या तोंडी) बळीपडावे लागे. लोकआर्थिकदृष्ट्या दुर्बल, धार्मिकदृष्ट्या अवमानित झाले होते. अशाखडतर प्रसंगी श्रीस्वामी समर्थांनी बावीस वर्षांच्या वास्तव्यात (इ.स. १८५६ ते १८७८) लोकांचा गेलेला आत्मविश्र्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्र्वास पुन्हा प्रस्थापित केला. त्यांनीविश्र्वसंचलनाचे कार्य तेथूनच सुरू केले.
मठांचा उद्देश
दत्तसंप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्यवर तयार केले. हिमालयातसंचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठस्थापना केली. त्यावेळीत्यांनी उपदेश केला की, “मठाचा उद्देश – मठातवेदशास्त्र चर्चा व्हावी, संसारीलोकांच्या पोटी दया उपजावी, प्रेमबुद्धीवाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन,कीर्तन, प्रवचन चालू असावे, धर्मजागृतीव्हावी आणि लोक सन्मार्गाला लागावेत हे मठाचे कार्य होय.
शिष्यांनी केलेली मठस्थापना
प्राकट्य काळात श्रीस्वामी महाराजांनी एकट्या बाळप्पाला अक्कलकोटच्या किल्ला रक्षणासाठी ठेवून अनेक उत्तम अधिकारी पुरुषांवर पारमार्थिक कृपा करून “किल्ला बांधुनि राहावे समुद्रतीरी,’ “एका झाडाखाली दुसरे झाड वाढत नाही’, “जेथून आलास तेथे जा” असे सांगितले. तरकाहींना काही विशिष्ट जागी जाण्यास सांगितले. श्रींनीतयार केलेल्या या ईश्र्वरनिष्ठांच्या मांदियाळीची, याज्ञात-अज्ञात शिष्यांची, प्रशिष्यांचीसंख्या सहज दोनशेच्या घरात जाईल. अष्टदिशीपसरलेल्या मराठी मुलखातील एका विशिष्ट कालखंडातील धर्म, परमार्थइतिहासाकडे दृष्टिक्षेप केल्यास असे दिसते की, इ.स. 1878 ते 1925 (स्वामी समाधिस्थ झाल्यानंतर) पर्यंतच्याकाळात या प्रदेशात अनेक साक्षत्कारी सत्पुरुष प्रकट झाले. श्रींच्यासर्व शिष्यांनी उपरोक्त काळात विदर्भ, मराठवाडा,खानदेश, कोकण, गोवा,मध्यप्रदेश, सुरत,बेळगाव, कर्नाटक, बडोदा,मुंबई व उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनेकानेक मठ स्थापन केले. त्यांनीस्थापन केलेल्या मठांची, मंदिरांचीसंख्या शेकडोंच्या घरात आहे. त्यांपैकीश्रींच्या कार्यप्रचाराने प्रेरीत काही मठांचे दर्शन करवीत आहोत.
१) श्रीगुरुमंदिर – बाळप्पा महाराज मठ, अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
धारवाड जिल्ह्यातील (कर्नाटकराज्य) श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या ३०
व्यावर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले.
श्रींनीअनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची
आज्ञा केली आणि म्हटले, “माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एखादा उत्तम
मठ स्थापन कर. तेथे फुलझाडे लावून बाग कर व ठरलेले वार्षिक उत्सव करीत जा.
म्हणजे चांगले फळ मिळेल.” त्यानुसार बाळप्पांनी मठ स्थापन केला.
प्रस्तुतमठात समर्थांचा दंड, छाटी, कंठमणी, माळ इत्यादी पवित्र वस्तू
ठेवलेल्या आहेत. बाळप्पांनीश्रीसमाधीस्थ झाल्यानंतर भारतभर संचार करून
शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा कीर्तीध्वज फडकविण्याचा
मान मिळविला. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज
यांनी ती धुरा वाहून नेली. यामठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,स्वामी जयंती
वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात.
२) वटवृक्ष संस्थान मठ, अक्कलकोट
अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने झाल्याचे दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. या परिसरात प्रवेश करताच मन स्वामीचरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत त्याला कांन लावल्यावर अनेक वादयांचे आवाज येतात असा भक्तांचा अनुभव आहे. स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता. अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रापठण चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथेच मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते. जवळच संस्थानचे ऑफिस आहे. भक्त द्रव्य रूपाने येथे सेवा अर्पण करू शकतात. सदर ट्रस्ट मार्फत येथे मंदिरालगत भक्त निवासाची व्य वस्था आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्तनिवास ५-६ इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे. तेथे छोटेखानी उपहार गृह आहे. येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात स्वामींच्या जीवनदर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. त्यातील काही फोटो अचम्बीत करतात. येथेही स्वामींची एक मूर्ती आहे.
आता या मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. येणाऱ्या भाविकांस पूजा, नैवेद्य,अभिषेक तसेच राहण्याची, भोजनाची व्यवस्था, खोल्या देऊन या संस्थानामार्फत केली जाते. श्रीनेहमी म्हणत, “आमचे नाव नृसिंहभान – दत्तनगरमूळ’ त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत. यामठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात.
३) श्रीस्वामी समाधी मठ, बुधवार पेठ, अक्कलकोट
४) जोशीबुवांचा स्वामी मठ, अक्कलकोट
अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसीपत्र वाहत असत. यानियमात खंड पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाटावर आपली पावले उमटविली. त्यांनी त्या पादुकांवर तुलसीपत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली. तोच श्रींचा जागृत अस्तित्व असलेला पाट या जोशी मठात होता. सध्या तो "गुरु मंदिरात' असल्याचे कळते.
५) शंकरराव राजेरायन यांचा मठ, अक्कलकोट
हैद्राबाद संस्थानातील गजांतलक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव राजे रायन
यांचा क्षय व ब्रह्मसमंध बाधा श्रींनी बरी केल्यावर त्यांनी श्रींच्या
आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा हा मठ स्थापन
केला. जुन्याराजवाड्याजवळ हा मठ आहे.
स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील आणखीन काही प्रासादिक स्थळे:
६. महाराजांच्या चर्मपादुका
समाधी मठच्या शेजारीच शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत. सुमारे १ फुट लांबीचे पाउल आहे.
७. हाक्याचा मारुती
स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर.तळघरत आजही जाता येते.
८. जंगमांचे शिव मंदिर
स्वामींनी शिवलींगावर शेणी रचून अग्नी पेटविला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले. ३ दिवस अग्नी पेटत होता. ३ दिवसा नंतर शिवलींगाला काहीही हानी न होता, ते अधिच तेजस्वी झाले.
९. मुरलीधर मंदिर
मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले ‘स्वामीसुत’ ह्या मंदिरात स्वामींची वाट पहात बसले होते. स्वामींच्या दर्शनास गेलेल्या एका श्रीमंत भक्तास स्वामी म्हणाले ”माझ्या समोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सुत काळोखात बसला आहे तेथे रोषणई कर.” गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन करणारे तेच हे स्वामीसुत!
१०. शेखनूर दर्गा
स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत. मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकांना स्वामी सांगत की दर्ग्यावर चदर चढवा. तिथल्या फकीराना भोजन द्या.
११. मालोजीराजांचा किल्ला
महा दरवाजावर असलेल्या गणपतीच्या मुर्तीस सहज हात लाऊन स्वामी जात असत्. आपला हात उडी मारुन देखील पोचत नाही. येथे एक लहानसे शस्त्रास्त्रांचे संग्रहालयही आहे.
१२. शिवपुरी
अक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात. ह्या हवनसाठी दूरवरून लोक येतात. यावर संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासकही भेट देतात.सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणहजे काय? इ. महत्वाची माहिती यएथे सांगतात. सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सुर्यास्ताच्या साधारण १ तास आधी पोचावे.
१३. श्रीमहारुद्ररावांची समाधी (श्रीचोळाप्पा महाराजांचे वाड्यातील श्रीमहाराजांच्या समाधी मठासमोर)
मोगलाई प्रांतात जोगाई आंब्यानजीक केज गावचे श्रीमंत महारुद्रराव देशपांडे यांचे निजाम सरकारने जप्त केलेले उत्पन्न श्रींचे कृपेने परत मिळाल्यानंतर तसेच घराच्या उकिरड्यावर द्रव्याने भरलेले हंडे सापडल्यानंतर ते अक्कलकोटला गेले. श्रींपुढे दहा हजार रुपये ठेवल्यानंतर श्री हसले व म्हणाले, “आम्हांस रुपये नको! जा नीघ घरी! घराचे उकिरड्यात नेऊन टाक आणि हा दगड तेथे नेऊन ठेव.” पुढे देशपांडे यांनी श्रींच्या आज्ञेनुसार घरासमोर उकिरड्यावर पादुका मठ स्थापन केल्या. श्रीस्वामींच्या लौकिक समाधीलीलेनंतरही श्रीस्वामींनी महारुद्ररावांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या केज येथील घरी जाऊन सगुण दर्शन दिले, ही बाब श्रीस्वामीरायांच्या ‘हम गया नहीं, जिंदा है|” ह्या वचनाची साक्षच देतात! आजही त्यांच्या वंशजांमार्फत मठाची सेवा अखंडित चालू आहे.
अक्कलकोट शेजारीच पाच किलोमीटरवर दहिटणे नावाचे गाव आहे त्या गावात बाराशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंती शैलीचे बांधकाम असलेले श्री मल्लिकार्जुन हे जागृत देवस्थान आहे. तसेच या गावात वीरभद्रेश्वर मंदिरही आहे. श्री वीरभद्रेश्वरांची यात्रा दसऱ्या दिवशी चालू होऊन पौर्णिमे दिवशी संपते. पारंपारिक जीवन जगत असलेल्या या गावात श्री मल्लिकार्जुन श्री वीरभद्रेश्वर यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. दहिटणे सारखेच श्री मल्लिकार्जुन मंदिर दहिटणे पासून तीन किलोमीटरवर असलेल्या चपळगावात देखील आहे. चपळगावात देखील श्री मल्लिकार्जुन महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे.
फोटो ५
बालवाटिकेतले प्राणी_१
फोटो ११
बालवाटिकेतले प्राणी_२
फोटो १२
बालवाटिकेतले प्राणी_३, फुलपाखरु
फोटो १३
विठ्ठल मंदीर
फोटो १४
नवीन राजवाडा_४
--------------
सेवा आणि देणगीसाठी
फोटो १५
फोटो १६
(( १८ - १९ सप्टेंबर २०१९ ( भाद्रपद कृष्ण चतुर्थी पंचमी, शके १९४१, मंगळवार - बुधवार.) यावेळची गोळा केलेली माहिती यावर आधारित लेखन. चुका दुरुस्ती, सूचनांचे स्वागत. ))
महाप्रसाद भवन,( महाप्रसाद दुपारी १२-३, ८-९:३०, नि:शुल्क),
दोन नाश्ता हॉटेल्स खासगी,
यात्री निवास,( एकट्यासाठी आणि गटासाठी.३००/-),
यात्री भुवन,( रुम दोघांसाठी शुल्क ८००/-),
अतिथी निवास,
गणेश मंदीर,
शिवशिल्प प्रदर्शन,
जिम,
लहान मुलांसाठी बालवाटिका ( मंगळ - बुधवार बंद),
बसेस आणि कारसाठी पार्किंग.
अक्कलकोट गावातली स्थळे -
स्वामींशी संबंधीत -
१) समाधी मठ
हा बस स्टँडमागेच आहे. दाट वस्तीत आहे. पार्किंगला फारशी जागा नाही. चोळप्पा शिष्याकडे आलेला.
२) गुरुमंदीर
बाळप्पा नावाच्या शिष्याकडे आलेला. हा वाडा पाहण्यासारखा आहे. स्वामी मंदीरापुढे फतेहसिंग चौकाच्या उजवीकडे भारत बोळात.
३) स्वामी मंदीर / वटवृक्ष स्वामी मंदीर
मुख्य मठ म्हणतात. याच्यासमोरच अन्नछत्र मंडळ परिसर आहे तो जन्मेजय राजे भोसले यांनी प्रस्थापित केला.
४) राजेराय मठ
या नावाचे एक वतनदार होते हैदराबाद संस्थानात. त्यांनी बांधला. भक्त निवास आतच आहे.
५) बेलानाथ मठ
क्र ४च्या समोरच आहे.
( या सर्व ठिकाणी फोटोग्राफी बंदी आहे.)
६) अक्कलकोट संस्थानाच्या इमारती
- जुना राजवाडा,किल्ला. यात कॉलेज आहे.
-नवा राजवाडा. यातली एक खोली पाहता येते. त्यात हत्यारे ठेवली आहेत. खरंतर सर्वच वाडा दाखवायला हवा.
भोसल्यांचे एक वंशज यांचे अक्कलकोट वतन. अर्धे गाव यांच्या मालकीचे आहे. आता कुणी राहात नाहीत इथे. पुण्यात राहतात.
७)वाडे
जुन्या पद्धतीचे वाडे आणि बोळ.
सर्व दोन किमिटरांत आहेत. रिक्षा, बस भरपूर.
जाण्याचे पर्याय -
अ) अक्कलकोट स्टेशन मार्गे.
अक्कलकोट स्टेशनला डावीकडे बाहेर (मुंबईकडून येताना) पडल्यावर बस् स्टॉप आहे. कर्नाटकच्या बसेसही असतात. या बसेस मुख्य बस स्ट्ँडला जातात.(१२ किमि) . गावात शिरताना राजेराय मठ स्टॉपपासून उजवीकडे नवीन गाणगापूर रोडवर दीड किमिवर 'स्वामी मंदीर' स्टॉप आहे. बस स्टँडवरून परत रिक्षाने स्वामी मंदीरला यावे लागते.
सिक्स सीटर ओटो असतात त्या स्टेशनवरून थेट स्वामी मंदीर'ला सोडतात (३०/-)
ब) सोलापूर मार्गे -
सोलापूर स्टेशनला सर्वच एक्सप्रेस ट्रेनस थांबतात. तिथून बसने अक्कलकोट बस
स्टँड ३५ किमि. काही बसेस पुढे स्वामी मंदीरपर्यंत येतात. येथून
तुळजापुरलाही जातात.
क) गाणगापूर -
अक्कलकोट बस स्टँड - स्वामी मंदीर - मैंदर्गी -अफजलपूर -गाणगापूर (५० किमि) कर्नाटक बसेस आहेत भरपूर.
१) सोलापुर जिल्हा गॅझेटीयर
२) https://mh13be.com/single/45
३) https://marathivishwakosh.org/18355/
४) http://travelbirdindia.blogspot.com/2019/08/akkalkot.html
५) https://iplmemes.com/akkalkot-palace-history-in-marathi/#google_vignette
६) https://www.uttar.co/question/5eda10328fb74d803a44bde0
७) माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
८)
९)
१०)
११)
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
अक्कलकोट हे सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते.
फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते.
संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती.
इतिहास :: सोळाव्या व सतराव्या शतकांत विजापूर व अहमदनगर येथील मुसलमान सत्ताधीशांत अक्कलकोट प्रदेशाबद्दल तंटे चालू असत. विजापूरच्या बादशहाने शहाजींना हा प्रदेश जहागीर म्हणून दिला होता. पुढे १६८७ च्या सुमारास औरंगजेबाने हा प्रदेश जिंकला. १६९९मध्ये त्याने शाहूच्या लग्नप्रसंगी त्याना जहागीर म्हणून अक्कलकोट परगणा दिला होता. दौलताबादच्या पारद गावचा पाटील शहाजी लोखंडे हा मोगलांतर्फे लढत असता शाहूकडून एका चकमकीत मारला गेला. तेव्हा त्याच्या विधवेने आपला मुलगा राणोजी यास शाहूच्या पायावर घातले. शाहूने या मुलाचा सांभाळ करण्याचे अभिवचन देऊन त्यास अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली व त्याचे नाव फत्तेसिंग ठेवले. हेच या संस्थानाचे संस्थापक होय. यांनी शाहूबरोबर अनेक लढायांत भाग घेतला. या घराण्यातील पाचवा राजा दुसरा शहाजी ( १८२८-१८५७) यांचा काळ धामधुमीचा गेला. १८२८मध्ये हा लहान असल्यामुळे या संस्थानचा कारभार साताऱ्याचे प्रतापसिंह पहात असे. १८३० मध्ये बोरगावच्या शंकरराव सरदेशमुखाच्या नेतृत्वाखाली रयतेने बंड केले. रयतेच्या प्रतापसिंहाविरुद्धच्या तक्रारी रास्त असल्याचा निर्णय घेऊन इंग्रजांनी संस्थानचा कारभार प्रतापसिंहाकडून काढून इंग्रज रीजंटाकडे सोपविला.
_________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव
_________________________
इ.स. १७०८मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=998953370502586&id=100011637976439
अक्कलकोट शहराची ख्याती सबंध महाराष्ट्रभर आणि देशभर पसरली ती म्हणजे दत्तावतारी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचेमुळे. श्री स्वामी समर्थाचा हा अवतार श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे कारकीर्दीत झाला. श्रीमंत मालोजीराजे भोसले हे स्वामी भक्त होते. अक्कलकोट मधील २२ वर्षांच्या वास्तव्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी अनेक चमत्कार करून यांची महती सर्व महाराष्ट्रभर पसरली. श्री. स्वामी समर्थाच्या या पावननगरी मध्ये अन्नछत्र असावे ही कल्पना सन्मा. जन्मेजय भोसले महाराजांनी उचलुन धरली व २९ जुलै १९८८ श्री गुरुपोर्णिमेच्या मुहूर्तावर हे अन्नछत्र सुरु झाले.
उत्तर लिहिले · 5/6/2
संस्थांचे पहिले नरेश
श्रीमंत फत्तेसिंह महाराज | अक्कलकोट संस्थांचे पहिले नरेश
छत्रपती शाहूंचे मानसपुत्र असलेल्या फत्तेसिंह भोसले यांचा जन्म सन १६९८ साली झाला. यांचे मूळ आडनाव लोखंडे, औरंगाबाद परिसरस्थित शाहूंच्या सैन्यावर सयाजी लोखंडे यांनी हल्ला केला, याच्या प्रतिकारात सयाजी लोखंडे मारले गेले. तेव्हा सयाजी लोखंडेच्या पत्नीने आपले तान्हं पोरं शाहूंच्या पायी घातले. शाहूंच्या महाराष्ट्रामधील आगमनादरम्यान झालेल्या पहिल्या लढाईच्या काळातील हा प्रसंग., पहिलीचं फतेह म्हणून या पुत्राचे नाव फत्तेसिंह ठेवले असेही उल्लेख फत्तेसिंह यांच्या नावाविषयी आढळतात. १७१२ साली शाहूंनी त्यांना सातारा येथे आणले व स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांचे पालनपोषण केले.साताऱ्यातील वाड्यात यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती. शाहूंच्या पत्नी विरुबाई यांचे फत्तेसिंहांवर जिवापाड प्रेम, अगदी पोटच्या पोराप्रमाणे, आणि तेवढ्याचं लाडात आणि उच्च व्यवस्थेत त्यांनी फत्तेसिहांना वाढविले. विरुबाईंच्या मृत्यूपश्चात त्यांचे उत्तरकार्य देखील फतेसिहांनी पार पाडले. यामुळेचं विरुबाई यांच्या नावे असणारी अक्कलकोट प्रांताची जहागीर फत्तेसिंह यांच्यानावे बहाल करण्यात आली.
कर्तबगार, कार्यधुरंदर आणि शाहूंचे मानसपुत्र असल्यामुळे फत्तेहसिहांना दरबारात विशेष मान होता.शिवरायांची राजधानी आणि मराठ्यांचे तख्त असलेला ‘रायगड‘ आणि जिजाऊ राहत होत्या ते पाचाड १६८९ पासून म्हणजे ४४ वर्षे पारतंत्र्यात होते, तेव्हा फत्तेसिंह भोसले आणि प्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले, मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि एक सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता, त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते. प्रयत्नास यश येऊन ६ जून म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकदिनीच रायगड वर भगवा फडकला. या कामगिरीबद्दल फत्तेसिंह भोसले यांच्या पराक्रमाचा छत्रपती शाहूंनी एका पत्रात विशेष उल्लेख केला.
१७२५ साली झालेल्या दक्षिणेतील स्वारीची संपूर्ण जवाबदारी शाहूंनी फत्तेसिंह यांच्यावर सोपविली होती., याच काळात ते तंजावरच्या छत्रपतींना भेटल्याच्यासुद्धा नोंदी आढळतात. १७३७ साली जेव्हा दक्षिणेत विशेष करून कर्नाटकवर जी स्वारी झाली यात मराठ्यांना घवघवीत यश मिळाले याच नेतृत्व फत्तेसिंह भोसले हेच करत होते, अनेक मोहिमांमध्ये, अनेक विषयांमध्ये अग्रणी असणारे फत्तेसिंह १५ डिसेंबर १७४९ नंतर म्हणजे छत्रपती शाहूयांच्या मृत्यूनंतर अक्कलकोट, आपल्या जाहगिरीत राहावयास गेले. अक्कलकोटच्या भुईकोट किल्ल्यामध्ये त्यांचे वास्तव्य होते. अशा या शाहूंच्या पराक्रमी पुत्राचे २० जानेवारी १७६० रोजी निधन झाले
पहिला फोटो फत्तेसिंह भोसले यांचा
दुसरा फोटो म्हणजे फत्तेसिंह भोसले यांचे समाधीस्थळ
तिसरा फोटो म्हणजे अक्कलकोट संस्थानचा नवा राजवाडा
स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१ च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.
इ.स. १७०८ मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही. संस्थातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.
अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले १९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
२००१ च्या जनगणनेनुसार अक्कलकोटची लोकसंख्या ३८,२१८ होती. पुरुष ५१ % आणि स्त्रिया ४९ % होत्या. अक्कलकोटमध्ये सरासरी ६३ % लोकांना लिहिता वाचता येत होते. (राष्ट्रीय सरासरी ५९.५) ५९ % पुरुष आणि ४१ % स्त्रिया साक्षर होत्या. लोकसंख्येच्या १४% सहा वर्षे वयाखालील मुले होती.
हे सुद्धा पहा संपादन करा अक्कलकोट येथील कारंजा चौक माणिक चौक तत्कालीन उपसेनापती माणिक माने यांच्या नावे ओळखले जाते हे खरे आहे काय? माणिक माने हे अक्कलकोट संस्थानात दरबार उपसेनापती होते व राज्य विलीनीकरण झाल्यावर त्यांना 192 पोलिसांच्या वरच्या पोलीस अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला होता. त्यांनी अक्कलकोट मध्ये उपद्रव माजविणारे समाजकंटक यांचा बंदोबस्त करून स्वतः या उपद्रवी लोकांना घोड्याच्या पायाला बांधून तेथील कारागृहात आणले. म्हणून त्यांच्या गौरवासाठी सदर चौकाला माणिक चौक हे नाव देण्यात आले असे म्हटले जाते. याचा काही पुरावा अक्कलकोट येथील संस्थानच्या कागद पत्रांमध्ये उपलब्ध असल्यास संदर्भासह नमूद करावा. अक्कलकोट रोड रेल्वे स्थानक संदर्भ आणि नोंदी
धार्मिक महत्त्व
अक्कलकोट स्वामी समर्थांची नगरी आहे. अक्कलकोट हे ठिकाण स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हाडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.
अक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात. ह्या हवनसाठी दूरवरून लोक येतात. यावर संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासकही भेट देतात.
अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत. अक्कलकोटमध्ये आता नवीन अन्नछत्र उभारण्यात आले आहे.
अक्कलकोट शेजारीच पाच किलोमीटरवर दहिटणे नावाचे गाव आहे त्या गावात बाराशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंती शैलीचे बांधकाम असलेले श्री मल्लिकार्जुन हे जागृत देवस्थान आहे. तसेच या गावात वीरभद्रेश्वर मंदिरही आहे. श्री वीरभद्रेश्वरांची यात्रा दसऱ्या दिवशी चालू होऊन पौर्णिमे दिवशी संपते. पारंपारिक जीवन जगत असलेल्या या गावात श्री मल्लिकार्जुन श्री वीरभद्रेश्वर यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे. दहिटणे सारखेच श्री मल्लिकार्जुन मंदिर दहिटणे पासून तीन किलोमीटरवर असलेल्या चपळगावात देखील आहे. चपळगावात देखील श्री मल्लिकार्जुन महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे.
अक्कलकोट संस्थान
स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी अक्कलकोट हे अठराव्या शतकापासून अस्तित्वात असलेले स्वतंत्र संस्थान होते. फतेहसिंह भोसले हे संस्थानाचे पहिले अधिपती होते. हे संस्थान डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखाली होते. संस्थान ४९८ चौरस मैलांत पसरलेले होते. संस्थानाची सीमा हैदराबाद संस्थान व बॉम्बे प्रेसिडेन्सीला लागून होती. इ.स. १९०१ च्या गणतीनुसार संस्थानाची वस्ती ८२,०४७ होती तर अक्कलकोट शहरात ८,३४८ व्यक्ती रहात होत्या. इ.स. १९११ साली संस्थानाने २६,५८६ रुपयांचा महसूल वसूल केला व त्यातील १,००० रुपये ब्रिटिश राज्याला खंडणी म्हणून दिले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे संस्थान नॉन-सॅल्यूट स्टेट या प्रकारांत मोडायचे.
इ.स. १७०८ मध्ये राणोजी लोखंडे याला पहिल्या छत्रपती शाहूंनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव फतेहसिंह भोसले झाले. इ.स. १८४८ पर्यंत अक्कलकोट सातारा संस्थानचा एक भाग होते. जेव्हा साताऱ्याच्या शाहूंना ब्रिटिश सरकारने राज्यभ्रष्ट केले, तेव्हापासून अक्कलकोटला स्वतंत्र संस्थानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर, स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत अक्कलकोटमध्ये कोणतीही राजकीय घटना घडली नाही. संस्थानातले स्थैर्य आणि संस्थानिकाचा शिवाजी महाराजांच्या घराण्याशी असलेला संबंध बघून अक्कलकोटच्या भोसले घराण्याचे अनेक मराठा सरदार घराण्यांशी नातेसंबंध जुळले.
अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक
१७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले
१७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले
१७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले
१८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले
१८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले
१८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले
१८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले
१८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह (तिसरे) भोसले
१९२३-१९५२ - विजयसिंहराव भोसले
१९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.
श्री क्षेत्र अक्कलकोट
श्री क्षेत्र अक्कलकोट (प्रज्ञापुर/विद्यानगर)
स्थान: सोलापूरपासून ४० कि. मी. अंतरावर, महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर.
सत्पुरूष: श्री स्वामी समर्थ.
विशेष: अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर, वटवृक्ष मंदिर, शिवपुरी, राजेरायन मठ
श्री क्षेत्र अक्कलकोट माहिती समाप्त
अक्कलकोट पॅलेस इतिहास Akkalkot Palace History in Marathi
Akkalkot Palace History in Marathi – अक्कलकोट पॅलेस इतिहास अक्कलकोट पॅलेसमध्ये आपले स्वागत आहे, जो भारतातील अक्कलकोट या आकर्षक शहरात वसलेल्या महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक विलक्षण पुरावा आहे. या लेखात, आम्ही अक्कलकोट पॅलेसच्या मनमोहक इतिहासाच्या अनोख्या प्रवासाला सुरुवात करतो, त्याची प्राचीन उत्पत्ती, स्थापत्य वैभव, ऐतिहासिक महत्त्व आणि त्याच्या भिंतीमध्ये विणलेल्या आकर्षक कथांचा मागोवा घेत आहोत.

अक्कलकोट पॅलेस इतिहास Akkalkot Palace History in Marathi
Table of Contents
प्राचीन मूळ
18 व्या शतकात प्रसिद्ध भोंसले घराण्याच्या संरक्षणाखाली बांधलेला, अक्कलकोट पॅलेस महाराष्ट्रातील त्यांच्या शक्ती आणि प्रभावाचे प्रतीक आहे. कला, साहित्य आणि स्थापत्यकलेच्या समर्थनासाठी ओळखल्या जाणाऱ्या भोंसलेंनी या भव्य राजवाड्याची स्थापना शाही निवासस्थान आणि सांस्कृतिक आणि राजकीय क्रियाकलापांचे केंद्र म्हणून केली.
आर्किटेक्चरल चमत्कार
अक्कलकोट पॅलेस राजपूत, मुघल आणि मराठा स्थापत्य शैलींचे विस्मयकारक संमिश्रण दाखवते. राजवाड्याचे गुंतागुंतीचे कोरीवकाम, सुशोभित कमानी, भव्य घुमट आणि उत्कृष्ट भित्तिचित्रे त्याच्या भिंती सुशोभित करतात आणि अभ्यागतांना मंत्रमुग्ध करतात. त्याची सममितीय मांडणी, प्रशस्त अंगण आणि विस्तृत बागा त्याचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवतात, अतिथींना ऐश्वर्य आणि भव्यतेच्या पूर्वीच्या युगात पोहोचवतात.
ऐतिहासिक महत्त्व
अक्कलकोट पॅलेसला त्याच्या वास्तुशिल्पाच्या पलीकडे ऐतिहासिक महत्त्व आहे. प्रभावशाली भोंसले शासकांचे निवासस्थान म्हणून काम करत, 18व्या आणि 19व्या शतकात महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्याला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राजे गोपिकाबाई पेशवे आणि राजे स्वामी समर्थ यासारख्या ख्यातनाम भोंसले शासकांनी या प्रदेशाचा इतिहास समृद्ध करणारा अमिट वारसा सोडला.
राजे गोपिकाबाई पेशवे: एक आदरणीय व्यक्तिमत्व
अक्कलकोट पॅलेसशी संबंधित प्रमुख व्यक्तींमध्ये, राजे गोपिकाबाई पेशवे चमकतात. मराठा साम्राज्यातील प्रमुख राजकीय व्यक्ती पेशवा रघुनाथराव यांच्या पत्नी या नात्याने त्यांनी अपवादात्मक नेतृत्व, धैर्य आणि परोपकाराचे प्रदर्शन केले. राजे गोपिकाबाईंच्या राजवाड्यातील उपस्थितीने अक्कलकोटला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला, राजकीय उलथापालथीच्या अशांत काळात मराठा हितांचे रक्षण केले.
राजे स्वामी समर्थ: आध्यात्मिक ऋषी
अक्कलकोट पॅलेसशी जोडलेले आणखी एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व म्हणजे राजे स्वामी समर्थ, एक आदरणीय आध्यात्मिक गुरू आणि संत जे त्याच्या भिंतीमध्ये राहत होते. भगवान दत्तात्रेयांचा अवतार मानल्या जाणार्या, स्वामी समर्थांनी त्यांचे दैवी मार्गदर्शन शोधत दूरदूरच्या भक्तांना आकर्षित केले. त्याच्या शिकवणी आणि आध्यात्मिक प्रभावाने अक्कलकोट पॅलेसला एक पवित्र तीर्थक्षेत्रात रूपांतरित केले, सांत्वन, ज्ञान आणि आशीर्वाद प्रदान केले.
दंतकथा आणि किस्से
अक्कलकोट पॅलेस पिढ्यानपिढ्या गेलेल्या मोहक दंतकथा आणि कथांनी भरलेला आहे. काही लोक त्याच्या भिंतीमध्ये लपलेल्या खजिन्याबद्दल बोलतात, तर काही त्याच्या परिसरात दैवी चमत्कार पाहणाऱ्या भक्तांचे गूढ अनुभव सांगतात. या मंत्रमुग्ध करणार्या कथा गूढतेची हवा भरतात, अभ्यागतांच्या कल्पनेला मोहित करतात आणि राजवाड्याला आश्चर्याचा आभास देतात.
जतन आणि जीर्णोद्धार
वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून, त्याचे स्थापत्य वैभव जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले गेले आहेत. सूक्ष्म जीर्णोद्धार कार्याने त्याचे पूर्वीचे वैभव पुनरुज्जीवित केले आहे, भविष्यातील पिढ्यांना त्याचा सांस्कृतिक वारसा समजू शकेल आणि समजू शकेल याची खात्री करून. सरकार, स्थानिक अधिकारी आणि हेरिटेज संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अक्कलकोट पॅलेसचे भूतकाळातील जिवंत पुराणात रूपांतर झाले आहे.
निष्कर्ष
अक्कलकोट पॅलेस हा इतिहासाचा गौरवशाली अवशेष म्हणून उंच उभा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सार आहे. त्याची वास्तुशास्त्रीय भव्यता, ऐतिहासिक महत्त्व आणि मनमोहक दंतकथा यामुळे इतिहासप्रेमी, वास्तुकला प्रेमी आणि अध्यात्मिक साधकांसाठी ते एक अप्रतिम गंतव्यस्थान बनते. जेव्हा तुम्ही त्याच्या भव्य हॉलमध्ये प्रवेश करता आणि त्याच्या लपलेल्या कथांचा शोध घेता तेव्हा तुम्ही अक्कलकोट पॅलेसच्या रहस्ये आणि रहस्यांमधून एक कालातीत प्रवास सुरू करता, तुमच्या आठवणींमध्ये त्याचे वैभव कायमचे छापून टाकता.
https://iplmemes.com/akkalkot-palace-history-in-marathi/#google_vignette
अक्कलकोटची माहिती व इतर स्थानिक महत्वाची धार्मिक क्षेत्र . ( AKKALKOT )
अक्कलकोट
भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. सदर क्षेत्र हे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आज हि येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे.
फोन- (०२१८१) २२०३२१, भक्त निवास-२२१९०९.
Blogger and Travel agent
WhatsApp number +918888741797
Use Google Translate App. or web site to read this artical in your own language . Use Marathi as source language and translate it in your own language.
Visit our Facebook page
Follow me on Twitter
http://travelbirdindia.blogspot.com/2019/08/akkalkot.html
ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम प्रतीचे असल्यामुळे त्यास तोफेच्या सलामीचा मान नव्हता.

सोळाव्या व सतराव्या शतकांत विजापूर व अहमदनगर येथील मुसलमान सत्ताधीशांत अक्कलकोट प्रदेशाबद्दल तंटे चालू असत. विजापूरच्या बादशहाने शहाजीस हा प्रदेश जहागीर म्हणून दिला होता. पुढे १६८७ च्या सुमारास औरंगजेबाने हा प्रदेश जिंकला. १६९९मध्ये त्याने शाहूच्या लग्नप्रसंगी त्यास जहागीर म्हणून अक्कलकोट परगणा दिला होता. दौलताबादच्या पारद गावचा पाटील शहाजी लोखंडे हा मोगलांतर्फे लढत असता शाहूकडून एका चकमकीत मारला गेला. तेव्हा त्याच्या विधवेने आपला मुलगा राणोजी यास शाहूच्या पायावर घातले. शाहूने या मुलाचा सांभाळ करण्याचे अभिवचन देऊन त्यास अक्कलकोट परगण्याची जहागिरी दिली व त्याचे नाव फत्तेसिंग ठेवले. हाच या संस्थानाचा संस्थापक होय. याने शाहूबरोबर अनेक लढायांत भाग घेतला. या घराण्यातील पाचवा राजा दुसरा शहाजी (१८२८–१८५७) याचा काळ धामधुमीचा गेला. १८२८ मध्ये हा लहान असल्यामुळे या संस्थानचा कारभार साताऱ्याचा प्रतापसिंह पहात असे. १८३० मध्ये बोरगावच्या शंकरराव सरदेशमुखाच्या नेतृत्वाखाली रयतेने बंड केले. रयतेच्या प्रतापसिंहाविरुद्धच्या तक्रारी रास्त असल्याचा निर्णय घेऊन इंग्रजांनी संस्थानचा कारभार प्रतापसिंहाकडून काढून इंग्रज रीजंटकडे सोपविला. १८४८ साली साताऱ्याचे राज्य खालसा झाले आणि अक्कलकोटकर ब्रिटिशांचे मांडलिक बनले.
स्वातंत्र्योत्तर काळात अक्कलकोट संस्थानाने विलीनीकरणास नकार दिला होता. रत्नाप्पा कुंभार यांनी तेथे सत्याग्रह सुरू केला. परिणामी हे संस्थान १९४८ मध्ये त्या वेळच्या मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. या घराण्यातील श्रीमती निर्मलाराजे भोसले या १९५२ पासून मुंबई विधानसभेच्या सदस्य, १९५६ ते १९६० पर्यंत शिक्षण खात्याच्या उपमंत्री आणि १९६२ ते १९६५ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण खात्याच्या मंत्री होत्या.
संदर्भ :
- पटवर्धन, वि. अ. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांच्या विलीनीकरणाची कथा, पुणे, १९६६.
https://marathivishwakosh.org/18355/
MH13BE
अक्कलकोट चा इतिहास | भाग पहिला
अक्कलकोट चा इतिहास | भाग पहिला
संस्थानाची सुरवात | अक्कलकोटचे भोसले
अक्कलकोट , सोलापूर भारताच्या महाराष्ट्र राज्यात आहे. 17 व्या शतकाच्या
सुरुवातीला हा निजामशाही प्रदेशाचा भाग होता. नंतर ते मुघल साम्राज्याचा
भाग होते, नंतर ते छत्रपती शाहू महाराज, मराठा सम्राट यांना अनुदान म्हणून
देण्यात आले ज्याने नंतर ते अक्कलकोट राजवंशचे संस्थापक यांना हस्तांतरित
केले. छत्रपती शाहू महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी
महाराजांचे नातू होते, आणि छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज असे
दोन मुले होते . मोठा मुलगा छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांचा
मुलगा छत्रपती शाहूला कैदी बनवले. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर,
छत्रपती शाहू महाराज मुक्त झाले आणि ते आपल्या मराठा राज्याचा दावा
करण्यासाठी परतले परंतु राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाईंनी त्यांचा
विरोध केला, जो त्यांच्या अनुपस्थितीत मराठा साम्राज्यावर राज्य करत होते.
त्याच्या दक्षिणेकडे छत्रपती शाहूंच्या सैन्यावर पारडच्या सयाजी लोखंडे
पाटील यांनी हल्ला केला, ताराबाईंचे अनुयायी, छत्रपती शाहूंनी ही लढाई
जिंकली. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी छत्रपती शाहूंना शरण गेली आणि
तिच्या तीन मुलांसह त्याची क्षमा मागितली. छत्रपती शाहूंना अनाथ मुलांची
दया आली आणि त्यांनी मोठा मुलगा राणोजीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.
आईने आनंदाने सहमती दर्शवली, छत्रपती शाहूंनी राणोजी लोखंडे पाटील दत्तक
घेतले आणि त्यांचे नाव फतेहसिंह असे बदलले आणि त्याशिवाय त्यांना "राजा"
आणि त्यांचे स्वतःचे आडनाव "भोंसले" अशी आनुवंशिक पदवी दिली आणि त्यांना
त्यांच्या सैन्याचा सेनापती (जनरल इन चीफ) बनवले. त्यानंतर त्याने त्याला
अक्कलकोटचा परगणा दिला जो त्याच्या मालकीचा होता.
अशा प्रकारे फतेहसिंह 1712 मध्ये अक्कलकोट राज्याचे पहिले शासक बनले.
हेच या संस्थानाचा संस्थापक होय. याने शाहूमहाराजबरोबर अनेक लढायांत भाग
घेतला. या घराण्यातील पाचवा राजा दुसरा शहाजी ( १८२८-१८५७) याचा काळ
धामधुमीचा गेला. १८२८ मध्ये हा लहान असल्यामुळे या संस्थानचा कारभार
साताऱ्याचा प्रतापसिंह पहात असे. १८३० मध्ये बोरगावच्या शंकरराव
सरदेशमुखाच्या नेतृत्वाखाली रयतेने बंड केले. रयतेच्या
प्रतापसिंहाविरुद्धच्या तक्रारी रास्त असल्याचा निर्णय घेऊन इंग्रजांनी
संस्थानचा कारभार प्रतापसिंहाकडून काढून इंग्रज रीजंटाकडे सोपविला. १८४८
साली साताऱ्याचे राज्य खालसा झाले आणि अक्कलकोटकर ब्रिटिशांचे मांडलिक
बनले.
१९२३ ते १९३६ the या काळात अक्कलकोटच्या ताराराजे डोगर राणीने तिचा मुलगा
विजयसिंहराजे अल्पवयीन असल्याने राज्यावर राज्य केले. तिच्या उत्कृष्ट
नियमासाठी तिला कैसर - ई - हिंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विजयसिंहराजे निर्दोषपणे मरण पावले आणि त्यांचा धाकटा भाऊ जयसिंहराजे
त्यांच्यानंतर गादीवर आला, जयसिंहराजे यांना कोणताही पुरुष मुद्दा नव्हता
.संयुक्ताराजे आणि सुनीताराजे या त्यांच्या दोन मुली अक्कलकोट राज्याच्या
फक्त दोन कायदेशीर वारस आहेत. भारतात एकल पालक दत्तक कायदा पास
झाल्यानंतर, संयुक्तराजे भोसले यांनी कुर्ला कुटुंब जिल्हा सातारा येथील
मनाजी राजे भोसले यांना दत्तक घेतले आणि त्यांचे नाव मालोजी तिसरे ठेवले.
स्वातंत्र्योत्तर काळात अक्कलकोट संस्थानाने विलीनीकरणास नकार दिला होता. श्री. रत्नाप्पा कुंभार त्यांनी तेथे सत्याग्रह सुरू केला. परिणामी हे संस्थान १९४८ मध्ये त्या वेळच्या मुंबई प्रांतात विलीन करण्यात आले. या घराण्यातील श्रीमती निर्मलाराजे भोसले या १९५२ पासून मुंबई विधानसभेच्या सदस्य, १९५६ ते १९६० पर्यंत शिक्षण खात्याच्या उपमंत्री आणि १९६२ ते १९६५ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण खात्याच्या मंत्री होत्या.
विशेष म्हणजे आता भारताचा ब्रीद वाक्य तेव्हा अक्कलकोट राज्याचा मोनोग्राम "सत्य मेव जयते" होता.
अक्कलकोट “गडी” चे शासक खालीलप्रमाणे होते -
वंशावळ -
फतेहसिंह I भोंसले (1712-1760)
शहाजी पहिला भोंसले (1760-1789):- पिलीवकर जहागीरदार कुटुंबातून दत्तक
फतेहसिंह दुसरा भोसले (1789-1823)
मालोजी पहिला भोंसले (1823-1828)
शहाजी II भोसले (1828-1857)
मालोजी II भोसले (1858-1870)
शहाजी तिसरा भोंसले (1870-1896)
फतेसिंह तिसरा भोसले (1894-1923):-कुराला राजे भोसले कुटुंबातून दत्तक
विजयसिंहराजे भोंसले (1936-1952)
जयसिंहराजे भोंसले (1952-1965)
संयुक्तराजे भोंसले (1949) आणि सुनीताराजे भोंसले (1954) दोघेही अविवाहित
कुलोरा राजे भोसले कुटुंबातून दत्तक घेतलेले मालोजी तिसरे भोसले यांनी 2005 मध्ये दत्तक घेतले
अक्कलकोट भुईकोट | Discover Maharashtra
अक्कलकोट भुईकोट –
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहरात फत्तेसिंह भोसले यांचा मजबूत भुईकोट आणि नवीन राजवाडा आहे. अक्कलकोट हे सोलापूरपासून साधारण ४० कि.मी अंतरावर आहे. अक्कलकोट स्वामी समर्थांच्या समाधी मंदिरामुळे सुप्रसिद्ध आहे व येथे भक्तांची गर्दी कायम पहायला मिळते. पण अक्कलकोट शहर हे दुसऱ्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे फत्तेसिंह भोसले नवीन राजवाड्यातील शस्त्रागारासाठी आशियातील सर्वात मोठे शस्त्रागार येथे पहायला मिळते.(अक्कलकोट भुईकोट)
अक्कलकोटचा भुईकोट हा प्रचंड मोठा आहे. त्याचे प्रवेशद्वार एकदम भव्य आहे. आतमध्ये मोठ्या राजवाड्यासारख्या वास्तू आहेत पण त्या मोडकळीस आल्या आहेत. भुईकोटाच्या दुसऱ्या बाजूस शाळा आहे. श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशाला, अक्कलकोट. शाळेच्या परिसरात नरसिंहाचे शिल्प आढळते. याशिवाय रतीमदन व नंदी यांचे शिल्प पाहावयास मिळते. अजस्त्र अशी तोफ आहे. भुईकोटाची तटबंदी आणि बुरूज आजही भक्कम स्थितीत आहेत.
नवीन राजवाड्याचे बांधकाम तिसरे फत्तेसिंह भोसले यांच्या कारकीर्दीत इ.स. १९१० ते १९२३ या काळात पूर्ण झाले. हा राजवाडा म्हणजे ब्रिटनच्या बंकिगहॕम पॕलेसची प्रतिकृती. एकदम भव्य दालने, चार मजली उंच घड्याळाचा मनोरा संपूर्ण पाश्चात्त्य शैलीत बांधलेला एकदम डोळे दिपवून टाकतो. राजवाड्यातील शस्त्रागारात आपल्याला विविध बंदूका, तोफा, अकराशेच्या आसपास वेगवेगळ्या तलवारी, भाले, ढाली, खंजीर, बाण असे अनेक प्रकारची शस्त्रे एकाच ठिकाणी पहायला मिळतात.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हौतात्म्यानंतर छत्रपती शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. इ.स. १७०७-०८ दरम्यान कैदेतून मुक्त झाल्यावर परत येताना वाटेवर काही सरदार त्यांना येऊन मिळाले. औरंगाबाद जिल्ह्यातील शिवणी परगण्यातील ‘पारद’ या गावचे बाबाजी लोखंडे पाटील यांनी शाहूराजांसोबत येण्याचे नाकारले व गढीचा दरवाजा बंद केला. शाहूराजांच्या सैन्याने गढीवर हल्ला चढवला. लोखंडे पाटील मारले गेले. बाबाजी पाटलांची सून अहिल्याबाई हिने आपले मूल शाहूराजांच्या पालखीत टाकले. शाहूराजांनी त्याचे “फत्तेसिंह” नामकरण करुन त्याचे पालकत्त्व स्विकारले. फत्तेसिंह पुढे मोठा झाला. त्यांनी कर्नाटक, जंजिरा मोहिमांत पराक्रम गाजवला. छत्रपती शाहूं महाराजांकडून त्यांना ‘अक्कलकोट’ परगणा मिळाला! दोन लाख पन्नास हजारांचा जहागीरदार फत्तेसिंह भोसले यांनी राममंदीर बांधले आणि वरील कोटात काही सुधारणा केल्या. त्याच्यानंतर शहाजीराजे यांच्याकडे वारसा आला. त्यांचे पुत्र फत्तेसिंह दुसरे गादीवर आले. इ.स.१८१८ ला मराठेशाही संपल्यावर ईस्ट इंडिया कंपनीने अक्कलकोट संस्थान निर्माण केले.
टीम – पुढची मोहीम
अक्कलकोट संस्थान शस्त्रागार | Discover Maharashtra

अक्कलकोट संस्थान शस्त्रागार –
अक्कलकोट नगरीला तीनशे वर्षांपासूनचा संस्थानी इतिहास आहे. त्याच्या खुणा नवाजुना राजवाडा, ऐतिहासिक मंदिरे, राजघराण्याची स्मारके यांतून या नगरीत अद्यापि दिसतात. त्यातील भोसल्यांचे शस्त्रागार महत्त्वाचे. अक्कलकोटचे संस्थान छत्रपती शाहू महाराजांच्या साताऱ्याच्या गादीबरोबर आकारास आले. राजे फत्तेसिंह भोसले हे शाहूंचे मानसपुत्र. ते या संस्थानचे पहिले राजे! ती गोष्ट १७०७ सालची. पुढे १८९६ ते १९२३ मध्ये फत्तेसिंह भोसले (तिसरे) हे राजे होऊन गेले. त्यांचे कर्तृत्व अलौकिक आणि त्यांची दृष्टी असामान्य. त्या राजाच्या काळातच अक्कलकोटचा नवा राजवाडा आणि त्यांचे शस्त्रागार उभे राहिले.(अक्कलकोट संस्थान शस्त्रागार)
त्यांचा नवा राजवाडा म्हणजे लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसची प्रतिकृती; तीसुद्धा सोलापूरजवळच्या अक्कलकोट शहरात! वर्तमानात वाटणारी ती विसंगती राजवाड्याच्या अवशेषांच्या रूपाने इतिहासातील ते वैभव आपल्या समोर उभे करू शकले. त्या राजवाड्याचे बांधकाम १९१० साली सुरू झाले. ते पुढे तब्बल तेरा वर्षांनी, १९२३ साली पूर्ण झाले. तो राजवाडा त्याच्या भव्यतेने दीपवून टाकतो. तो पाश्चात्य शैलीत आहे. तो अष्टकोनी, तीन मजले उंच आहे. असंख्य खोल्या, दालने, स्तंभ-कमानीच्या रचना आणि त्या साऱ्यावर चार मजली उंच घड्याळाचा मनोरा. तेथील या मातीत ते सारे चित्र अद्भुत वाटते.
वाड्याच्या दर्शनी भागावर अक्कलकोट संस्थानचे राजचिन्ह आहे आणि त्याखाली ‘सत्यमेव जयते’ ही त्यांची राजमुद्राही आहे. आपल्या देशाचे म्हणून वापरात असलेले ते बोधवाक्य कधीकाळी अक्कलकोट संस्थान होते!
राजवाड्याच्या पहिल्या मजल्यावर शस्त्रागार आहे. राजे फत्तेसिंह भोसले (तिसरे) यांना वेगवेगळी शस्त्रे जमवण्याचा छंद होता . त्यांना अवघे अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी रणांगणावरील पराक्रम गाजवलाच तो पराक्रम गाजवणारी पण त्याबरोबर असंख्य शस्त्रेही जमवली. त्या संग्रहातून अक्कलकोटचे हे शस्त्रागार १९२२ साली आकाराला आले. सुरुवातीची अनेक वर्षे संग्रहालय अक्कलकोटचा जुन्या किल्लेवजा राजवाड्यात होते, ते सुरक्षिततेच्या कारणास्तव २००२ मध्ये नव्या राजवाड्यात हलवण्यात आले. अकराशे तलवारी, दोनशेहून अधिक बंदुका, तेवीस लहानमोठ्या तोफा, बावन्न पिस्तुले; तसेच, कट्यार, गुप्ती, बिचवे, खंजीर, भाले, परशू, अंकुश, वाघनखे, बाण आणि आणखी कितीतरी… त्या हत्यारांचे वैविध्य आणि संख्याबळच प्रेक्षकाचे डोळे दिपवून टाकते.
आयुधांचा प्रवास सुरू होतो तो तलवारींच्या खणखणाटाने! वेगवेगळ्या आकार-प्रकारांतील पाती! शिवकालीन बाकदार, पेशवाईतील सरळ, मुस्लिम सत्ताधीशांच्या पल्लेदार, ब्रिटिशांच्या आखूड अशा अनेक तलवारी तेथे दिसतात. अन्य परदेशांतील तलवारींचे नमुनेही तेथे आहेत. त्यातूनच मग ब्रिटिशांची किरिंची, सळसळत्या रूपातील नागीण, सरळ धारेची नायर, जाडजूड पात्याची खांडा या आगळ्या तलवारी पुढे येतात. त्यांची तेथील मांडणीही वेगळ्या प्रकारे केली आहे. उगवत्या, मध्यान्हीच्या आणि मावळत्या सूर्याच्या आकृतीत तलवारी तेथे तळपत आहेत.
सूर्याच्या त्या अवस्था साकार करताना त्यांनी ढालींचे गोळे आणि बाण-कट्यारींची किरणे बनवली आहेत. यज्ञकुंडाच्या धर्तीवर छोट्या तलवारींपासून तेथे जागोजागी धगधगती ‘शस्त्रकुंडे’ चेतवली आहेत. आकार-रूपाने वेगवेगळय़ा जातींच्या त्या तलवारी पोलाद, चांदी आणि काही तर चक्क सोन्याच्या पाण्यापासून बनवलेल्या आहेत. काहींच्या मुठीवरील लेखांमधून त्यांच्या कर्त्यांकरवित्याची माहिती मिळते, तर काहींवर असलेली गोल छिद्रे त्या प्रत्येकामागे शंभर माणसे मारली असल्याचा हिशोब सादर सांगतात.
कट्यारी, बिचवे, कुकरी, कोयते, भाले, बाण, गुप्ती, अंकुश, परशू अशी शत्रूच्या रक्ताला चटावलेली हत्यारे एकेक करत पुढे येऊ लागतात. अचानक उघडणारी दुधारी कट्यार, शत्रूवर फेकले जाणारे सुरे, वेध घेणारे बाण, धावत्या घोड्यावरून मारा करण्याचे भाले, हत्तीवरील ‘अंकुश’, जडावातील खंजीर-कट्यारी असा सारा हत्यारांचा मामला प्रेक्षकास सामोरा येऊ लागतो. त्यांच्या अधे-मधे बचाव करणारी चिलखते, शिरस्त्राण, जिरेटोप, अंगरखा आणि त्या ढाली यांचे सुरक्षाकवचही दिसते.
हत्यारांची दालने जातात आणि पुढच्या दालनात हत्यारांनीच वेध घेतलेल्या शिकारी प्रेक्षकास दिसू लागतात. वाघ, बिबटे, अस्वल, गवा, तरस, रानडुक्कर आणि तेथील सांगवी तलावातील मगरी… या शिकारी तेथे पेंढा भरून ठेवलेल्या आहेत.
शिकारीनंतंरच्या पुढच्या काही दालनांमधून बंदूक-तोफांचे आवाज निघू लागतात. देशी-विदेशी, इतिहास-वर्तमानातील अशा असंख्य बंदुका त्यांची उत्क्रांतीची कथा सांगू लागतात. ठासणी, तोड्या, केप, रायफली, किराबीन, पिस्तूल, संगिनी अशा वेगवेगळ्या जातींच्या बंदुका, प्रत्येकीचा आकार, रंग-रूप आणि सावज निराळ्या टप्प्यांतील. तळहातावर बसेल अशा पिस्तुलापासून ते बारा फूट लांबीच्या बंदुकीपर्यंतचा तो सारा प्रवास! पंचधातूच्या, उखळी, छोट्या-मोठ्या आकारातील तोफा आणि पहिल्या महायुद्धात वापरलेल्या मशिनगन्स देखील तेथे दिसतात.
राजे फत्तेसिंह यांनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांकडून भाग घेतला होता. त्या दरम्यान ब्रिटिशांशी जुळलेल्या मैत्रीतून त्यांनी ही देशी-विदेशी असंख्य हत्यारे मिळवली. पण ब्रिटिश धूर्त होते. त्या पराक्रमी राजाच्या हाती ती हत्यारे त्यांनी ती निकामी करून दिली.
संग्रहालयात ऐतिहासिक भांडी, मौल्यवान-शोभेच्या वस्तू, खेळणी असा अन्य संग्रहही आहे. संस्थानच्या राजांची तैलचित्रे आहेत. सर्वत्र दिसणाऱ्या सिंहासनाऐवजी हत्तीच्या पायापासून बनवलेले आगळेवेगळे ‘गजासन’ तेथे आहे. अक्कलकोट संस्थानच्या वंशजांकडून त्या साऱ्या ऐतिहासिक ठेव्याचे पिढ्यान् पिढ्या जतन केले जात आहे. सध्या ती जबाबदारी श्रीमंत महाराज मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले ( तिसरे ) हे पार पाडीत आहेत .
ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू या त्या त्या काळा-वेळाचे दर्शन घडवतात. कधी काळी बांधलेला हा अक्कलकोटचा राजवाडा आणि त्यातली ही जुनी ऐतिहासिक हत्यारे पाहताना हाच अनुभव येतो. शस्त्रांचा हा खणखणाट सतराव्या शतकातील रणभूमीवर घेऊन जातो. यामुळे श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाने भक्तिरसात बुडालेले मन शस्त्रागारातून बघताना इतिहासातही चिंब भिजून जाते.
अश्या या दैदीप्यमान संस्थान चा गादीवारस श्रीमंत महाराज मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले ( तिसरे ) हे सांभाळीत आहेत.
Cr – फेसबुक काका
अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले
छत्रपती
शिवरायांच्या मृत्यूनंतर परकीयांच्या ताब्यात गेलेला रायगड पुन्हा
मराठ्यांकडे आणणारे शाहूंचे मानसपुत्र आणि अक्कलकोट संस्थानचे संस्थापक
श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांचा २० नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यांचा हा
अल्प परिचय...
........
११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजीराजे यांची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर नऊ महिन्यांतच रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसूबाई व पुत्र बालशिवाजी (शाहू) मुघलांचे कैदी बनले. पुढे १७०७मध्ये नगरमध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर बादशहा बनलेला आजम दिल्लीच्या वाटेवर असताना त्याने भोपाळजवळील दारोहा येथून थोरले शाहूमहाराज यांची सुटका केली.
शाहूमहाराज आपले राज्य घेण्यासाठी दक्षिणेत येत असता त्यांच्याबरोबर असलेल्या सैन्याला पारद या गावी शहाजी लोखंडे-पाटील यांनी प्रतिकार केला. शाहूमहाराज यांच्यासोबत असलेले सैन्य शहाजी लोखंडे-पाटलावर चालून गेले. पारद या गावी छोटी लढाई होऊन त्यात गावचे पाटील मारले गेले. त्या वेळी त्यांच्या विधवा पत्नीने नुकतेच जन्माला आलेले मूल शाहू महाराजांच्या पायावर घालून अभय मागितले. शाहूमहाराजांनी हा आपला पहिलाच विजय मानून आनंदाने त्या मुलाचा स्वीकार केला. पारद गावी शाहूमहाराजांची फत्ते झाली. म्हणून फत्तेसिंह असे नाव ठेवून त्याला बरोबर घेतले. हा मुलगा म्हणजेच अक्कलकोट संस्थानचे संस्थापक फत्तेसिंहराजे भोसले होय.
पुढे त्यांच्या मुलांमध्ये तंटा निर्माण होऊन त्यांच्या तीन शाखा वेगवेगळ्या प्रांतावर आपापल्या परीने वर्चस्व गाजवू लागल्या. अक्कलकोट, पिलीव आणि राजाचे कुर्ले येथे फत्तेसिंहराजे भोसले यांचे पुढील वारसदार राहू लागले. राजाचे कुर्ले या गावी राजे-भोसले यांचा भुईकोट किल्ला आहे. जवळपास तीन ते चार एकर परिसरात हा किल्ला बांधण्यात आला आहे. तसेच पिलीव येथे जहागीरदारांचा मोठा किल्ला आहे.
शाहूमहाराजांचे पेशवे पहिले बाजीराव व फत्तेसिंह भोसले हे समवयस्क होते. शाहू छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर दिल्लीच्या बादशहाकडून दख्खनच्या सहा सुभ्याचे चौथाई आणि सरदेशमुखीपणाचे हक्क प्राप्त झाले. त्याचे वाटप शाहू छत्रपतींनी आपल्या सरदारांमध्ये करून त्यांचे क्षेत्र ठरवून दिले. फत्तेसिंह भोसले यांना शाहूमहाराज राजपुत्राप्रमाणे मानीत असत. त्यामुळे सहा सुभ्यांपैकी कर्नाटकाचा सुभा फत्तेसिंह भोसले यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केला. फत्तेसिंह भोसले यांना भागानगरचाही (हैदराबाद) सुभा मिळावा अशी शाहू छत्रपतींची इच्छा होती. त्यावेळी हा सुभा मुघलांच्या ताब्यात होता.
१७२५मध्ये शाहू छत्रपतींनी निजामाला रोखण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांना कर्नाटकात कामगिरी करण्याची आज्ञा केली. फत्तेसिंह भोसले यांनी चित्रदुर्गपासून पश्चिमेस सौंदे बिदनूरपर्यंतच्या सर्व खंडण्या वसूल केल्या. सर्व ठाणी मराठ्यांच्या हातची गेली होती, ती सोडवून परत आपल्या ताब्यात घेतली. गरजेनुसार जरब देऊन काम फत्ते केले. ही मोहीम १७२५पासून ते १७२६पर्यंत फत्तेसिंह भोसले यांच्या आधिपत्याखाली पार पडली.
यापूर्वीच सन १७१३मध्ये शाहू छत्रपतींनी दक्षिणेतील सहा सुभ्यांपैकी महत्त्वाचा असा हा कर्नाटकचा सुभा फत्तेसिंह भोसले यांच्याकडे दिला होता. या सुभ्यावर आपली हुकमत वाढावी म्हणून मोहिमेचे नेतृत्व फत्तेसिंह भोसले यांच्याकडे दिले होते. तंजावरचे सरफोजीराजे भोसले यांनाही मदत करण्याची आज्ञा फत्तेसिंह भोसले यांना दिली होती. त्याप्रमाणे तंजावरला जाऊन त्यांनी सरफोजीराजे भोसले यांची भेट घेतली. मोहिमेचे नेतृत्व फत्तेसिंह भोसले यांच्याकडे सोपवले गेले. वयाच्या केवळ अठराव्या वर्षी फत्तेसिंह भोसले यांनी आयुष्यातील पहिलीच लष्करी मोहीम पार पाडली.
तंजावरकर भोसलेंना अर्काटचा नबाब सादुल्ला खान त्रास देत असे. कोप्पळ, कर्नुल, कडप्पा, तिरुपती, व्यंकटगिरी, येलूर, जिंजी अशी तंजावरला जोडणाऱ्या प्रदेशांची ही साखळी. शिवछत्रपतींनी निर्माण केलेले हे स्वराज्य, छत्रपतींच्या निधनानंतर २७ वर्षे सतत औरंगजेबाशी झगडून मराठ्यांनी राखलेला हा प्रदेश आपल्या हातातून जाऊ नये या उद्देशाने कर्नाटकची मोहीम आखली होती.
या मोहिमेचे नेतृत्व अठराव्या वर्षी फत्तेसिंह भोसले यांना मिळाले. फत्तेसिंह भोसले स्वारीस निघाले म्हणजे प्रतिनिधी व प्रधान यांनी त्यांच्याबरोबर स्वारीत जावे असा शाहू महाराजांनी निर्बंध केला होता. यावरून शाहू महाराजांनी त्यांना राजपुत्राला शोभेल अशी व्यवस्था केल्याचे दिसून येते. फत्तेसिंह भोसले यांना युवराजाप्रमाणे मान छत्रपती देत होते. त्यांचा सन्मान वाढवीत होते.
मार्च १७२६मध्ये कर्नाटकची मोहीम पार पाडून फत्तेसिंह भोसले सातारा येथे आले, तेव्हा शाहू छत्रपतींनी त्यांचा सन्मान केला. त्यांनी सर्व खजिना व झालेले वृत्त महाराजांना निवेदन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तख्ताची जागा रायगड ही परक्यांच्या ताब्यात होती. ती परत मराठी दौलतीत आणण्यासाठी शाहू छत्रपतींनी फत्तेसिंह भोसले यांना सांगितले. ही एक महत्त्वाची कामगिरी होती. या मोहिमेला जंजिरा मोहीम असे नाव होते. ही मोहीम सन १७३१पासून सन १७३४पर्यंत चालली आणि रायगड ही छत्रपतींच्या तख्ताची जागा मराठ्यांच्या परत ताब्यात आली. शाहू महाराजांच्या हुकुमाप्रमाणे काम करून फत्तेसिंह भोसले यांनी मोहीम तडीस नेली.
छत्रपतींनी रघुजी भोसले यांना स्वतःचे पुत्र मानले होते. त्यांना मुख्य सेनापती नेमून रघुजी फत्तेसिंह यांच्या मदतीला दिले होते. फत्तेसिंह हे पापभीरू व दयाळू स्वभावाचे होते. त्यामुळे स्वारीची सूत्रे रघुजींकडे आली. अर्काटचा नबाब व त्रिचनापल्लीस चंदाखानाची खोड मोडून रघुजीने पराक्रम केला होता; पण स्वतःचे निशाण त्रिचनापल्लीवर न चढवता फत्तेसिंह बाबांचेच निशाण चढवले गेले. यावरून रघुजी भोसले यांनी फत्तेसिंह भोसल्यांचा सन्मान राखण्यात कोणताही कमीपणा केला नव्हता.
मराठी साम्राज्य चौफेर वाढवण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांचा उपयोग मराठ्यांचे शूर पराक्रमी रघुजी भोसले यांनी करून घेतला होता. त्रिचनापल्ली ते मुर्शिदाबाद हा सारा मुलुख पराक्रमाने तोडून तो मराठी राज्यात सामील होण्यासाठी फत्तेसिंह भोसले यांचे योगदान मराठी इतिहासाला विसरता येणार नाही.
शाहू छत्रपतींची एक राणी वीरूबाई फत्तेसिंह भोसले यांना पुत्रवत मानीत असे. शाहू छत्रपतींच्या इतर राण्यांपेक्षा वीरूबाईंचा मान सर्वांत मोठा होता. या वीरूबाईंना संतती नसल्याने फत्तेसिंह भोसले यांनाच त्या आपला पुत्र मानत होत्या. शाहू छत्रपतींच्या दोन राण्या सकवारबाई आणि सगुणाबाईसाहेब यांच्यावरसुद्धा वीरूबाईंची हुकमत चालत असे.
वीरूबाईंच्या मृत्यूवेळी फत्तेसिंह भोसले कर्नाटकात स्वारीवर गुंतले होते. फत्तेसिंह भोसले यांना वीरूबाई पुत्राप्रमाणे मानीत असल्याने त्यांचे उत्तरकार्य फत्तेसिंह भोसले यांच्या हातून पुढे केले गेले. वीरूबाईंची दौलत, द्रव्य व पायातील सोन्याच्या साखळ्या फत्तेसिंह यांनाच मिळाल्या. फत्तेसिंह भोसले यांनीही देव्हाऱ्यात वीरूबाईसाहेबांची सोन्याची मूर्ती करून बसवली. ती अद्यापही त्या घराण्याकडे आहे.
फत्तेसिंह भोसले अत्यंत मृदू स्वभावाचे होते. त्यामुळे स्वराज्याच्या उलाढालीपासून ते दूर राहिल्यामुळे पेशव्यांना मराठी दौलतीचा सर्वाधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. फत्तेसिंह भोसले यांनी मराठी दौलतीची जोखीम घेण्याची इच्छा व्यक्त केली असती, तर छत्रपतीपद त्यांच्याकडे येण्यास काहीच अडचण आली नसती. ही बाब त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवणारी होती. फत्तेसिंह भोसले यांना गोविंदराव चिटणीस यांनी कारभार करण्याविषयी विचारले असता त्यांनी कानावर हात ठेवले होते. याचाच अर्थ हे तख्त आपणास स्वीकारायची इच्छा नाही असाच होतो. फत्तेसिंह भोसले यांची कारकीर्द सन १७१२पासून सन १७६०पर्यंत होती. त्यांनी स्वतंत्रपणे अनेक मोहिमा करून आपले शौर्य तेज प्रकट केले होते.
फत्तेसिंह भोसले यांनी कोल्हापूर, कर्नाटक, बुंदेलखंड, भागानगर, त्रिचनापल्ली या प्रांतावर अनेक स्वाऱ्या केल्या. मराठ्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शाहू महाराजांना त्यांनी उत्कृष्ट साह्य केले. छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर फत्तेसिंह भोसले अत्यंत उदास झाले. ते अक्कलकोट येथे निवास करू लागले. सातारचा राज्यकारभार त्यांनी बाजूला ठेवला.
पेशव्यांच्या राज्यकारभाराच्या घडामोडींपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. शाहू छत्रपतींच्या मृत्यूनंतर रामराजांचा राज्याभिषेक होऊन पेशव्यांनी दौलतीची सर्व सत्ता हाती घेतली व नवीन छत्रपती झालेल्या रामराजांना राज्य करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. सातारा येथे घडत असलेल्या घटना फत्तेसिंह यांच्या मनाला क्लेशदायक वाटत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतःला दूर ठेवले होते.
अशातच फत्तेसिंह भोसले यांचा २० नोव्हेंबर १७६० रोजी अक्कलकोट येथे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोघी स्त्रियांनी सहगमन केले. अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्यातील जुने संस्थान आहे. अशा या वैभवशाली पराक्रमी आणि शूर घराण्याच्या कामगिरीची अगदी अलीकडेसुद्धा प्रचिती येते. अक्कलकोटमध्ये जुना राजवाडा, नवीन राजवाडा, जलमंदिर, उत्तम शस्त्रागार, धर्मशाळा, उद्यान, रस्ते, वीज, शिक्षण या सर्वच बाबतीत या घराण्याचे योगदान विशेष आहे.
शौर्यशाली फत्तेसिंहराजे भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)
अक्कलकोट काय आहे बघू म्हणून प्रथमच गेलो होतो. भरपूर पाऊस असल्याने गाड्या वेळेवर जातील का शंका होती.
बऱ्याच जणांनी सोलापुरला रेल्वेने जाऊन पुढे बसने जा असा सल्ला दिला.
अक्कलकोट रोड नावाचे स्टेशनही आहे आणि तिथे जाण्यायेण्याच्या वेळा ( १०
वाजता सकाळी. चेन्नई मेल, उद्यान एक्सप्रेस) चांगल्या वाटल्याने तीच तिकिटं
काढली. सध्या तमिळनाडूत तीव्र पाणी टंचाई आणि इतर ठिकाणी फार पाऊस यामुळे
गाड्यांची तिकिटं सहज मिळाली.
जाण्याचे पर्याय -
अ) अक्कलकोट स्टेशन मार्गे.
अक्कलकोट स्टेशनला डावीकडे बाहेर (मुंबईकडून येताना) पडल्यावर बस् स्टॉप आहे. कर्नाटकच्या बसेसही असतात. या बसेस मुख्य बस स्ट्ँडला जातात.(१२ किमि) . गावात शिरताना राजेराय मठ स्टॉपपासून उजवीकडे नवीन गाणगापूर रोडवर दीड किमिवर 'स्वामी मंदीर' स्टॉप आहे. बस स्टँडवरून परत रिक्षाने स्वामी मंदीरला यावे लागते.
सिक्स सीटर ओटो असतात त्या स्टेशनवरून थेट स्वामी मंदीर'ला सोडतात (३०/-)
ब) सोलापूर मार्गे -
सोलापूर स्टेशनला सर्वच एक्सप्रेस ट्रेनस थांबतात. तिथून बसने अक्कलकोट बस
स्टँड ३५ किमि. काही बसेस पुढे स्वामी मंदीरपर्यंत येतात. येथून
तुळजापुरलाही जातात.
क) गाणगापूर -
अक्कलकोट बस स्टँड - स्वामी मंदीर - मैंदर्गी -अफजलपूर -गाणगापूर (५० किमि) कर्नाटक बसेस आहेत भरपूर.
--------------------
अक्कलकोट गावातली स्थळे -
स्वामींशी संबंधीत -
१) समाधी मठ
हा बस स्टँडमागेच आहे. दाट वस्तीत आहे. पार्किंगला फारशी जागा नाही. चोळप्पा शिष्याकडे आलेला.
२) गुरुमंदीर
बाळप्पा नावाच्या शिष्याकडे आलेला. हा वाडा पाहण्यासारखा आहे. स्वामी मंदीरापुढे फतेहसिंग चौकाच्या उजवीकडे भारत बोळात.
३) स्वामी मंदीर / वटवृक्ष स्वामी मंदीर
मुख्य मठ म्हणतात. याच्यासमोरच अन्नछत्र मंडळ परिसर आहे तो जन्मेजय राजे भोसले यांनी प्रस्थापित केला.
४) राजेराय मठ
या नावाचे एक वतनदार होते हैदराबाद संस्थानात. त्यांनी बांधला. भक्त निवास आतच आहे.
५) बेलानाथ मठ
क्र ४च्या समोरच आहे.
( या सर्व ठिकाणी फोटोग्राफी बंदी आहे.)
६) अक्कलकोट संस्थानाच्या इमारती
- जुना राजवाडा,किल्ला. यात कॉलेज आहे.
-नवा राजवाडा. यातली एक खोली पाहता येते. त्यात हत्यारे ठेवली आहेत. खरंतर सर्वच वाडा दाखवायला हवा.
भोसल्यांचे एक वंशज यांचे अक्कलकोट वतन. अर्धे गाव यांच्या मालकीचे आहे. आता कुणी राहात नाहीत इथे. पुण्यात राहतात.
७)वाडे
जुन्या पद्धतीचे वाडे आणि बोळ.
सर्व दोन किमिटरांत आहेत. रिक्षा, बस भरपूर.
काही अनुभुती येण्याइतकी माझी प्रगती नाही परंतू राजवाडे फारच आवडले.
गेली तीन वर्षे इथे धरण भरेल असा पाऊस झाला नाही. कुठून लांबून ट्यांकरने पाणी येते.
फोटो १
नकाशा . सोलापूर, अक्कलकोट,गाणगापूर.
फोटो २
बस वेळापत्रक, अक्कलकोट बस स्टँड.
फोटो ३
श्री वटवृक्ष स्वामी मंदीर - जुना राजवाडा - नवीन राजवाडा - अक्कलकोट बस स्टँड मार्ग. नकाशा.
________________________
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात
महाप्रसाद भवन,( महाप्रसाद दुपारी १२-३, ८-९:३०, नि:शुल्क),
दोन नाश्ता हॉटेल्स खासगी,
यात्री निवास,( एकट्यासाठी आणि गटासाठी.३००/-),
यात्री भुवन,( रुम दोघांसाठी शुल्क ८००/-),
अतिथी निवास,
गणेश मंदीर,
शिवशिल्प प्रदर्शन,
जिम,
लहान मुलांसाठी बालवाटिका ( मंगळ - बुधवार बंद),
बसेस आणि कारसाठी पार्किंग.
फोटो ४






































No comments:
Post a Comment