Tuesday, November 28, 2023

धोत्रीचा किल्ला

   सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात एक सुस्थितील गढी आहे, या गढीला धोत्रीचा किल्ला या नावाने ओळखळे जाते. सोलापूर पासून २४ कि.मी.अंतरावर धोत्री गावात हा धोत्रीचा किल्ला आहे. इथे जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१) सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पासून १९ किमीवर कर्देहळ्ळी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. कर्देहळ्ळी पासून १४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
२) सोलापूर - हैद्राबाद रस्त्यावर सोलापूर पासून १५ किमीवर ब्राम्हणी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. या रस्त्याने मुसळी - तांदुळवाडी मार्गे २४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे. धोत्रीला जाण्यासाठी सोलापुरवरुन बस तसेच खाजगी रिक्षा आहेत. 
   धोत्री गावात राहण्याची सोय नाही. सोलापूर किंवा अक्कलकोट येथे रहाण्याची चांगली सोय आहे. तसेच धोत्री गावात जेवणाची सोय नाही.किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे. सोलापूरहून सकाळी निघून धोत्री किल्ला पाहून नळदुर्ग किल्ला  किंवा इतर ठिकाणे जसे अक्कलकोट पहायला जावे.
धोत्री गावाचे प्रवेशद्वार 

   मध्ययुगीन काळात बांधलेला हा किल्ला भुईकोट प्रकारातील असुन किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नाही. सोलापुरहुन धोत्री गावात जाताना दुरवरून गडाची तटबंदी व बुरूज आपले लक्ष वेधुन घेतात. रस्त्यावरूनच किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत असल्याने सहजपणे किल्ल्यात जाता येते. या भुईकोटाच्या तिन्ही बाजुला धोत्री गाव आहे तर एका बाजुला मोकळी जागा आहे. 

Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur

Entrance to Dhotri Fort at Dhotri Village near Solapur

धोत्री गावातून किल्ल्याच्या एका भव्य बुरुजाला वळसा घालून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो. 
 साधारण आयताकृती आकार असलेला हा किल्ला पूर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ दोन एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरूज असुन त्यातील दक्षिणेच्या कोपऱ्यातील दोन बुरूज एकमेकाशी जोडून आहेत. 




दहा बुरुजापैकी कोपऱ्यातील चार बुरूज मोठया आकाराचे व तटबंदीतील उरलेले सहा बुरूज मध्यम आकाराचे आहेत. किल्ल्याच्या तटबंदी व बुरुज पांढऱ्या चिकट मातीच्या बनवलेल्या असुन त्यांना मजबुती देण्याकरता खालील भागात आतुन व बाहेरून दगडी बांधकाम केलेले आहे तर वरील बाजुस विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेला बालेकिल्ला सुरक्षित करण्यासाठी त्याला बाहेरील बाजूने अजुन एक तटबंदी घालुन दुहेरी तटबंदीने सुरक्षित केला आहे. त्यामुळे किल्ला तीन भागात विभागला गेला असुन रणमंडळातून आत आल्यावर मुख्य दरवाजातून आत न जाता बाहेरील दोन तटबंदीच्या मधील भागात फिरता येते. 






















या भागात प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने शेवटपर्यंत जाता येत नाही. हा झाला किल्ल्याचा पहिला भाग. या तटबंदीत शिरण्यासाठी दरवाजा असावा पण तो पुर्णपणे कोसळून गेला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन कधीकाळी दरवाजासमोर असणारी रणमंडळाची रचना पुर्णपणे ढासळून गेलेली आहे. प्रवेशव्दारा जवळील तटबंदीत सज्जा असुन प्रवेशव्दाराला अलीकडे लाकडी दरवाजा बसवलेला दिसुन येतो. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच असुन दरवाजाच्या आत दोनही बाजुला पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. यातील एका देवडीतुन वर सज्जावर व तिथुन बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच आयताकृती मोकळे मैदान असुन त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. डाव्या बाजुच्या तटबंदीतील कोपऱ्याच्या बुरूजात एक कोठार दिसुन येते. किल्ल्याचा हा दुसरा भाग असुन उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारालाही पहारेकऱ्यासाठी दोन्ही बाजुस देवड्या असुन आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायऱ्या व त्याच्या टोकाशी कमान असणारी चौकोनी विहिर आहे. विहीरीत पाणी असुन ते पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज दिसतात पण प्रत्यक्षात दक्षिण दिशेचे दोन बुरुज बाहेरील तटबंदीत आहेत. स्थानिक लोकांच्या मते भुईकोटात ३६ खोल्या असून इथून चोरवाट अक्कलकोटला जाते. 







प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला असलेल्या टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी बुरुजाच्या आतुनच वळणदार पायऱ्या आहेत. किल्ल्यातील हा सर्वात मोठा व उंच बुरूज असुन या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना लक्षात येते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. किल्ल्याचे अंतर्गत अवशेष पुर्णपणे ढासळलेले असुन असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने अवशेषांची शोधयात्रा करावी लागते. बुरुजाच्या अलीकडे काही अंतरावर जमिनीला समांतर पायऱ्या असुन जमिनीखाली १५ x २० फुट आकाराचे तळघर आहे. तळघराच्या पुढील बाजुस अजुन एका वास्तूचा दरवाजा दिसतो. हि वास्तू दोन दालनाची असुन पायऱ्या उतरून कवळ पहिल्या दालनापर्यंत जाता येते. येथे खूप मोठया प्रमाणात वटवाघुळ असल्याने दुसऱ्या दालनात शिरता येत नाही. या भागातील तटबंदीत अनेक उध्वस्त वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. हा बालेकिल्ल्याचा भाग असुन किल्ल्याचा तिसरा भाग आहे. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा असुन या दरवाजाने आपल्याला सर्वप्रथम पाहिलेल्या पहिल्या भागाच्या टोकाशी जाता येते. या दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला पायऱ्या असणारी दुसरी मोठी चौकोनी विहीर दिसते. हि विहीर गाळाने भरलेली असुन आतील पाणी पिण्यायोग्य नाही. समोर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान दिसते. या तटबंदीच्या दोन टोकाला दोन बुरुज असुन डाव्या बाजुच्या बुरुजावर जाण्यासाठी विटांनी बांधलेला बंदिस्त कमानीदार मार्ग दिसतो पण तिथे जाण्याची वाट मात्र अतिशय बिकट आहे. या बुरूजावर जाण्यासाठी विहिरीच्या वरील बाजुस असणारा दरवाजा माती पडुन पुर्णपणे बुजला असुन वरची केवळ कमान दिसते. या कमानीतून आपल्याला अक्षरशः पोटावर सरकत शिरावे लागते पण आत आल्यावर मात्र हि धडपड सार्थ झाल्याची वाटते. या बुरुजावरून देखील संपुर्ण किल्ला दिसतो. या तटबंदीच्या बाहेरील बाजूला तटबंदीला लागुनच एक तलाव व त्याच्या काठावर लहानसे मंदिर दिसते. येथे आपली किल्ल्याची फेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास दीड तास लागतो.


पोहोचण्याच्या वाटा :
१) सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पासून १९ किमीवर कर्देहळ्ळी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. कर्देहळ्ळी पासून १४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
२) सोलापूर - हैद्राबाद रस्त्यावर सोलापूर पासून १५ किमीवर ब्राम्हणी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. या रस्त्याने मुसळी - तांदुळवाडी मार्गे २४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
धोत्री गावात राहण्याची सोय नाही. सोलापूर किंवा अक्कलकोट येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय :
धोत्री गावात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.
सूचना :
सोलापूरहून सकाळी निघून धोत्री किल्ला पाहून नळदुर्ग किल्ला पहायला जावे.

Dhotri Fort is located in Dhotri village. The road to the village is not in good condition. Will test car and bike suspension. Deserted roads to reach the village. Farms on either side of the road.

Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur

After visiting Solapur Fort we headed off to see Dhotri Fort. Finally reached Dhotri village. Directions to Dhotri Fort are tagged on google maps. There is a fort like entrance to visit the village.

The fort is surrounded by the village on one side and loose soil on the other. The fort walls are intact. A certain part of it has collapsed but the pattern is untouched. The same kind of stone is used to build houses of the locals around the fort. So not sure if the houses are also that old or it's just the fort.

Apart from the stone that can see seen from the outside, it has walls of mud in it. The mud walls are around 10 feet broad.

A couple of children were playing cricket in the quadrangle of the fort. Again there is only one door to access the fort.
They became out guide and showed us around the fort. The helped us up the stone stairs to climb the wall. Initially when Manohar tried to be enter bats came running out, reminded me of Indiana Jones.
Quadrangle of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur
They also should us a small entrance in the wall. As per the kids there are 36 small rooms in there and also a secret underground road that leads to Akkalkot fort.
Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur
There are also a couple of wells in the fort premises, but they are empty, plus there is dried wild grass growing all over the fort premises. The golden grass reminded me of my Peth Fort exploration. 
Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur
It took us around 30 minutes to see the fort.

The locals themselves don't know as to who built the fort, strange.
Way to Akkalkot Fort from Dhotri Fort at Dhotri Village near Solapur
Also strange to hear that Kannada is the second language here.
Fortification of Dhotri Fort at Dhotri Village near Solapur
There are st buses and shared rickshaw available in village.
We then headed off to Naldurg in Osmanabad.
 
 

Dhotri Fort

Unknown

Type: Land Fort- Gadhi

Base Village: Dhotri
Where: 270 Kms from Pune, 25 Kms from Solapur
Route Taken: Pune-Solapur-Dhotri (Take Solapur-Hannur internal road, off Solapur-Hyderabad expressway)
Time visited: Jan 2014Time to see: 0.5 hrs.
Food/Water:  Food/Stay is available only at Solapur.
Parking: Park your vehicle near the Main entrance (Gav- Ves). It’s a 5 min walk through narrow lanes till the entrance of the fort.

Well this might not be a really a worth effort to go explicitly to this place unless you are either really enthusiastic about historical places OR you are travelling in interiors of Solapur. For me it was both and hence decided to take a look at this unknown place.  Things to see are a Dry well, A store room beneath the South Bastion and a stupendous curved staircase.

Main Courtyard

Huge courtyard in the center and the expanse of the fort in the left (as seen from above)


The most interesting feature is curved staircase on the south Bastion.

There is small door on the right that open in huge area. Just on the left the entrance to the staircase to south bastion is hidden in the bushes. You will need to climb down slowly...

The Staircase

While coming down

While coming down- further below


The Panorama of the village from the Top

Fortification seems to be of thick Stone and Mud Walls

http://ekpravas.blogspot.com/2014/01/dhotri-fort.html

धोत्री

प्रकार : गढी

जिल्हा : सोलापुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर पासून २४ कि.मी.अंतरावर धोत्री गावात धोत्रीचा किल्ला आहे. मध्ययुगीन काळात बांधलेला हा किल्ला भुईकोट प्रकारातील असुन किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नाही. सोलापुरहुन धोत्री गावात जाताना दुरवरून गडाची तटबंदी व बुरूज आपले लक्ष वेधुन घेतात. रस्त्यावरूनच किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत असल्याने सहजपणे किल्ल्यात जाता येते. साधारण आयताकृती आकार असलेला हा किल्ला पूर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ दोन एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरूज असुन त्यातील दक्षिणेच्या कोपऱ्यातील दोन बुरूज एकमेकाशी जोडून आहेत. दहा बुरुजापैकी कोपऱ्यातील चार बुरूज मोठया आकाराचे व तटबंदीतील उरलेले सहा बुरूज मध्यम आकाराचे आहेत. किल्ल्याच्या तटबंदी व बुरुज पांढऱ्या चिकट मातीच्या बनवलेल्या असुन त्यांना मजबुती देण्याकरता खालील भागात आतुन व बाहेरून दगडी बांधकाम केलेले आहे तर वरील बाजुस विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेला बालेकिल्ला सुरक्षित करण्यासाठी त्याला बाहेरील बाजूने अजुन एक तटबंदी घालुन दुहेरी तटबंदीने सुरक्षित केला आहे. त्यामुळे किल्ला तीन भागात विभागला गेला असुन रणमंडळातून आत आल्यावर मुख्य दरवाजातून आत न जाता बाहेरील दोन तटबंदीच्या मधील भागात फिरता येते. या भागात प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने शेवटपर्यंत जाता येत नाही. हा झाला किल्ल्याचा पहिला भाग. या तटबंदीत शिरण्यासाठी दरवाजा असावा पण तो पुर्णपणे कोसळून गेला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन कधीकाळी दरवाजासमोर असणारी रणमंडळाची रचना पुर्णपणे ढासळून गेलेली आहे. प्रवेशव्दारा जवळील तटबंदीत सज्जा असुन प्रवेशव्दाराला अलीकडे लाकडी दरवाजा बसवलेला दिसुन येतो. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच असुन दरवाजाच्या आत दोनही बाजुला पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. यातील एका देवडीतुन वर सज्जावर व तिथुन बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच मोकळे मैदान असुन त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. डाव्या बाजुच्या तटबंदीतील कोपऱ्याच्या बुरूजात एक कोठार दिसुन येते. किल्ल्याचा हा दुसरा भाग असुन उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारालाही पहारेकऱ्यासाठी दोन्ही बाजुस देवड्या असुन आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायऱ्या व त्याच्या टोकाशी कमान असणारी चौकोनी विहिर आहे. विहीरीत पाणी असुन ते पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज दिसतात पण प्रत्यक्षात दक्षिण दिशेचे दोन बुरुज बाहेरील तटबंदीत आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला असलेल्या टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी बुरुजाच्या आतुनच वळणदार पायऱ्या आहेत. किल्ल्यातील हा सर्वात मोठा व उंच बुरूज असुन या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना लक्षात येते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. किल्ल्याचे अंतर्गत अवशेष पुर्णपणे ढासळलेले असुन असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने अवशेषांची शोधयात्रा करावी लागते. बुरुजाच्या अलीकडे काही अंतरावर जमिनीला समांतर पायऱ्या असुन जमिनीखाली १५ x २० फुट आकाराचे तळघर आहे. तळघराच्या पुढील बाजुस अजुन एका वास्तूचा दरवाजा दिसतो. हि वास्तू दोन दालनाची असुन पायऱ्या उतरून कवळ पहिल्या दालनापर्यंत जाता येते. येथे खूप मोठया प्रमाणात वटवाघुळ असल्याने दुसऱ्या दालनात शिरता येत नाही. या भागातील तटबंदीत अनेक उध्वस्त वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. हा बालेकिल्ल्याचा भाग असुन किल्ल्याचा तिसरा भाग आहे. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा असुन या दरवाजाने आपल्याला सर्वप्रथम पाहिलेल्या पहिल्या भागाच्या टोकाशी जाता येते. या दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला पायऱ्या असणारी दुसरी मोठी चौकोनी विहीर दिसते. हि विहीर गाळाने भरलेली असुन आतील पाणी पिण्यायोग्य नाही. समोर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान दिसते. या तटबंदीच्या दोन टोकाला दोन बुरुज असुन डाव्या बाजुच्या बुरुजावर जाण्यासाठी विटांनी बांधलेला बंदिस्त कमानीदार मार्ग दिसतो पण तिथे जाण्याची वाट मात्र अतिशय बिकट आहे. या बुरूजावर जाण्यासाठी विहिरीच्या वरील बाजुस असणारा दरवाजा माती पडुन पुर्णपणे बुजला असुन वरची केवळ कमान दिसते. या कमानीतून आपल्याला अक्षरशः पोटावर सरकत शिरावे लागते पण आत आल्यावर मात्र हि धडपड सार्थ झाल्याची वाटते. या बुरुजावरून देखील संपुर्ण किल्ला दिसतो. या तटबंदीच्या बाहेरील बाजूला तटबंदीला लागुनच एक तलाव व त्याच्या काठावर लहानसे मंदिर दिसते. येथे आपली किल्ल्याची फेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास दीड तास लागतो.
© Suresh Nimbalkar 










 धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))     किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग     डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर     श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्ह्यातील धोत्री गावात एक सुस्थितील गढी आहे, या गढीला धोत्रीचा किल्ला या नावाने ओळखले जाते. या गढीतील मातीच्या बुरुजात बनवलेला वळणदार जिना पहाण्यासारखा आहे.





















 
पहाण्याची ठिकाणे :
धोत्री गावातून किल्ल्याच्या एका भव्य बुरुजाला वळसा घालून आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी येतो. किल्ल्याचा उत्तराभिमुख मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच आहे. या प्रवेशव्दाराला नविन लाकडी दरवाजा बसवलेला आहे. प्रवेशव्दाराजवळील तटबंदीत सज्जा आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर दोनही बाजूंना देवड्या आहेत. समोर आयताकृती रिकाम मैदान आहे. त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. किल्ल्याच्या सर्व तटबंदीच्या व बुरुजांच्या भिंती पांढर्या मातीच्या बनवलेल्या आहेत. त्यांना आतील व बाहेरच्या बाजूने संरक्षणासाठी दगड व विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायर्यांची सुकलेली चौकोनी विहिर आहे. बालेकिल्ल्याला चार बुरुज आहेत. दक्षिण टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी वळणदार जीना आहे. या जिन्याने बुरुजावर चढून गेल्यावर संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना समजते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. या तटबंदीच्या कडेकडेने पश्चिमेकडील तटबंदीकडे चालत जातांना वाटेत वास्तूंचे उध्वस्त अवशेष पहायला मिळतात. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा आहे. या दरवाजातून पुढे गेल्यावर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान आहे. या मैदानाच्या दोन टोकाला दोन बुरुज आहेत. उजव्या बाजूला एक कोरडी विहिर आहे. हे सर्व पाहून झाल्यावर किल्ल्याची फेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा :
१) सोलापूर अक्कलकोट रस्त्यावर सोलापूर पासून १९ किमीवर कर्देहळ्ळी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून डाव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. कर्देहळ्ळी पासून १४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
२) सोलापूर - हैद्राबाद रस्त्यावर सोलापूर पासून १५ किमीवर ब्राम्हणी गाव आहे. येथे मुख्य रस्ता सोडून उजव्या बाजूचा छोटा रस्ता पकडावा. या रस्त्याने मुसळी - तांदुळवाडी मार्गे २४ किमीवर धोत्री गावात किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
धोत्री गावात राहण्याची सोय नाही. सोलापूर किंवा अक्कलकोट येथे रहाण्याची चांगली सोय आहे.
जेवणाची सोय :
धोत्री गावात जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
किल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.
सूचना :
सोलापूरहून सकाळी निघून धोत्री किल्ला पाहून नळदुर्ग किल्ला पहायला जावे.

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...