नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरची शेजारची मोठी गावे आहेत. नातेपुते हे पुणे-पंढरपूर या किंवा जुन्या महाड-पंढरपूर या रस्त्यावर आहे. तसेच ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. ते सातारा जिल्ह्यात १९३० पर्यंत होते. त्यापुढे पूर्वीचा माणदेशी परिसर. बोलीभाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा तशाच. गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात. वार्षिक सरासरी पाऊसमान चारशे ते पाचशे मिलिमीटर. परंतु सध्या नीरा उजव्या कालव्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली आहे.
नातेपुते गावाचा इतिहास इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत पाहता येतो.नातेपुते गावाचा इतिहास पाहता ह्या गावाचे पुरातन नाव नर्तकीपुर होते असे आढळते. नन्तरच्या काळामध्ये ह्याचे अपभ्रंश होऊन नातेपुते नाव अडले असावे. तसेच इतिहासकाळात ‘शंकरापट्टण’ असेही नाव होते. नातेपुते गावाचे ग्रामदैवत गौरीहर मंदिराच्या बांधकामावरून ते ध्यानी येते. देऊळ बहामनी काळात (१३५०) हेमाडपंती शैलीत बांधले गेले आहे. गावाबाहेरील तळ्याचा नातेपुते गावाच्या पाणीपुरवठा योजनेत साठवण तलाव म्हणून वापर होतो. त्यास फुटके तळे असे म्हणतात. तलावाच्या बांधकामावरील चिन्हावरून तो इतिहास देवगिरीच्या यादव राजांपर्यंत पोचतो. येथील मुख्य वतनदार पैकी एक देशपांडे होते .नातेपुते परिसरातील २९ गावची वतनदारी अधिकार देशपांडे घराण्याकडे होते.येथील गढीला अनन्यसाधारण महत्त्व होते शिवपूर्व काळापासून चालत आलेलं हे वतन होते . यांचा मुख्यपुरूष होनाजी आप्पा असा उल्लेख वांशावळीत आढळतो अंदाचे १३ पिढ्यांची वंशावळ त्यांचा वंशाजांकडे आढळून आली आहे त्यातील होनाजी आप्पा हे मुख्य पुरुष असल्याचा संदर्भ सापडतो. .

वीर संताजी घोरपडे, सेनापती याची हत्या १६९७ च्या आषाढ महिन्यात नागोजी माने म्हसवडकर याने केली. बादशहाचा तळ त्यावेळी ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे होता. त्याने बादशहाकडे अर्ज करून ज्या मागण्या केल्या आहेत त्यात नातेपुतेची गढी त्याला मिळावी; तसेच, ती गढी आतील साहित्य, शस्त्र, दारुगोळा यांसह मिळावी असा अर्ज औरंगजेब बादशहाकडे केला. त्यावरून त्या ठिकाणची गढी लष्करी दृष्ट्या महत्त्वाची होती हे लक्षात येते. गंगाधरशास्त्री यांचा खून पंढरपूर क्षेत्रामध्ये १८१५ मध्ये झाला. त्रिंबकजी डेंगळे हा दुसर्या बाजीरावाचा कारभारी. त्यानेच तो खून केल्याचे सांगून बाजीराव पेशव्यांमार्फत त्याला अटक करण्यास भाग पाडले. त्याला १८१५ च्या ऑक्टोबरमध्ये ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. इंग्रजांनी तुरुंगातील बंदोबस्तासाठी दक्षता घेऊनही त्रिंबकजी १२ सप्टेंबर १८१६ रोजी फरार झाला. त्याने तुरुंगातून तबेल्याच्या भिंतीस भोक पाडले. त्याने त्यासाठी घोड्याची निगा राखणारा इसम हाती धरला. तो बाजीरावाने पाठवला होता. तो घोड्याच्या तबेल्यात राहून निगा राखता राखता गाणी गायचा. त्या गाण्याचा अर्थ इंग्रज शिपायांना कळत नसे, पण त्रिंबकजीला समजत असे. त्रिंबकजी त्याचा फायदा घेऊन निसटला. तो प्रथम खानदेशात गेला. नंतर सातार्याजवळ महादेवाच्या डोंगरात राहू लागला. त्याने त्यावेळी नातेपुते भागातील लोकांतून मदतीसाठी बारा विश्वासू सहकारी तयार केले. त्याने ब्रिटिशांविरूद्ध बंडाळी पुन्हा चालू केली. ब्रिटिशांनी त्रिंबकजीला पकडून देणार्याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, त्रिंबकजीचा नुसता ठावठिकाणा, पत्ता लावून देणार्यास इंग्रजांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस व एक चाहूर जमीन देण्याचे जाहीर केले.
त्रिंबकजींचा पत्ता ठाऊक असून जर कोणी त्याची माहिती इंग्रजांना दिली नाही तर त्याचे पारिपत्य केले जाईल असा जाहीरनामा पेशव्याने जरी काढून त्यावेळच्या पंढरपूरच्या कमाविसदार बाबुराव गणेश याला कळवला तरी प्रत्यक्ष बाजीराव पेशवाच त्रिंबकजीला सहाय्य करत होता. त्रिंबकजी डेंगळे याने जमवलेले विश्वासू बारा साक्षीदार नावानिशी पुढीलप्रमाणे : 1. बापू गायकवाड शेटफळकर, 2. नागोजी वाळुंज, 3. रविराव शिंदे लोणीकर, 4. महादजी पंत नातेपोतेकर, 5. तिमाप्पा वडारी, 6. गोधाजी डेंगळा, 7. सयाजी मुळे, 8. आप्पाजी पाकुरवावीकर,9. निंबाजी जाधव फलटणकर, 10. महिपतराव डेंगळा, 11. बापू वरडकर, 12. दाजी डफळे.
बाजीराव पेशव्याने नातेपुते महालाचा महालकरी त्रिंबकजीला मदत व्हावी असाच कारकून नेमला.
त्यावेळी घटना ज्या घडत होत्या त्याचे नातेपुते हे काही काळ केंद्रच बनले. संताजी घोरपडे, सेनापती याची हत्या १६९७ च्या आषाढ महिन्यात नागोजी माने म्हसवडकर याने केली. बादशहाचा तळ त्यावेळी ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे होता. त्याने बादशहाकडे अर्ज करून ज्या मागण्या केल्या आहेत त्यात नात्यापोत्याची गढी त्याला मिळावी; तसेच, ती गढी आतील साहित्य, शस्त्र, दारुगोळा यांसह मिळावी असा अर्ज औरंगजेब बादशहाकडे केला. त्यावरून त्या ठिकाणची गढी लष्करी दृष्ट्या महत्त्वाची होती हे लक्षात येते. गढीचे काही अवशेष नातेपुते गावी दिसून येतात. त्रिंबकजी साष्टीच्या तुरुंगातून पळाला, त्याने वरघाटी येऊन-डोंगरात राहून जमाव सुरू केला.
आल्याड नातंपुतं, पल्याड शिंगणापूर |
दवण्यासाठी गेला, भोळा शंकर दूर ||
वाजत्याती वाजांतरी, नात्यापुत्याच्या लवनी |
भोळ्या शंभू महादेवाचं गेलं लगीन लागुनी ||
दवणा नावाची एक सुंगंधी व औषधी वनस्पती ह्या भागात आढळते. वरील ओव्यांनुसार, ह्याच दवणा वनस्पतीच्या शोधार्थ शिवशंकर कैलासावरून नातेपुते परिसरामध्ये आले आणि इथे त्यांना देवी पार्वती दिसली. नन्तर ह्या दोघांचे शिखर शिंगणापूरला लग्न लावण्यात आले. पार्वतीचे माहेरचे नाव होते गिरीजा, म्हणून नातेपुते गावामध्ये असलेल्या शिवमंदिराला गिरिजापती मंदिर म्हणतात. तसेच पार्वतीचा भाऊ बळियाप्पा याचे मंदिर देखील गिरिजापती मंदिराच्या जवळच आहे. हि दोन्ही मंदिरे पुरातन हेमाडपंथी शैलीतील आहेत.
ग्रामदैवत गौरीहराचे मंदिर हे मराठवाड्यातील लोकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे. तेथे चैत्र शुद्ध पंचमी ते अष्टमी या काळात मोठा उत्सव असतो. अनेक मानाच्या काठ्या व कावडी वाजतगाजत पायी देवाला पाण्याने अभिषेक घालण्यासाठी येतात. पंचमीला देवाला हळदी लागतात व अष्टमीला मध्यरात्री देवाचा विवाह सोहळा पार पडतो. या शिव-पार्वती विवाहासाठी मराठवाड्यातील भातंगडी गावाच्या ‘भातंगडी काठी’चा मान मोठा आहे. भातंगडी काठी म्हणजे पाण्याची कावड देवाला वाहिली जाते. पुढे ती काठी शिखर शिंगणापूरी जाते. पाण्याच्या अशा अनेक कावडी चैत्र यात्रेवेळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पायीपायी, वाजतगाजत येतात. विवाह समारंभ मंदिरात रात्री होतो. देवळासमोरील उंच दीपमाळा पेटवल्या जातात. दीपमाळा शिखर शिंगणापूरच्या उंच डोंगरावरील देवळावरून दिसतात. तो लग्नसोहळा गावातील मानकरी, वतनदार, बडवे, भोसले, कलावंत-शेख, पाटील, देशमुख, देशपांडे, सर्व गावकरी आनंदाने मिळून पार पाडतात. लग्नातील नवरदेवाचा मान धनगर समाजातील माळशिरसच्या वाघमोडे पाटलांकडे तर नवरीचा मान नातेपुत्याच्या पांढरे-पाटील घराण्याकडे आहे.गावकरी दैनंदिन जीवनात परंपरेने चैत्र महिन्यात अनेक गोष्टी व्रताप्रमाणे पाळतात. श्री शंकर-पार्वतीचे लग्न प्रतीकात्मकच असते.
नातेपुते गावातील गिरिजापती मंदिर, बळीराजाचे मंदिर, समोरील तळे व संपूर्ण परिसर हा सातार्याचे राजे भोसले कुटुंबीयांच्या खाजगी मालकीचा आहे. सातार्याच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संस्थानाकडून लिलाव पद्धतीने दरवर्षी दैनंदिन पूजाअर्चा व व्यवस्थेचे नियोजन केले जाते. बडवे कुटुंबीय पिढ्यान्पिढ्या ते सर्व श्रद्धेने व निष्ठेने करतात. देवाच्या पूजाअर्चा व व्यवस्था यांसाठी सातारा संस्थानातर्फे पुजारी बडवे, घडशी समाजाचे भोसले व कलावंत-शेख यांच्या कुटुंबीयांना उपजीविकेसाठी वतने म्हणून जमिनी दिलेल्या आहेत व देवस्थानाची व्यवस्था लावून दिलेली आहे.

मंदिर एका उंचवाट्या वर बांधले आहे , सभामंडप आहे तर मंडपात ३ नंदी आहेत . सभामंडप , अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे .भरभक्कम दगडी खांब असलेला सभामंड्प, सभामंडपामध्ये विराजमान असलेला नन्दी आणि मुख्य देव-गाभारा अशी मंदिराची बांधणी आहे. गर्भगृहात एका पीठावर २ लिंगे आहेत , त्यापैकी एक महादेवाचे तर दुसरे माता पार्वतीचे आहे नातेपुते पासून जवळ असलेल्या शिखर-शिंगणापूर च्या डोंगरावर शुंभु महादेवाचा व माता पार्वतीचा विवाह होतो , श्रद्धेने हे मंदिर माता पार्वतीचे माहेर समजले जाते . मंदिरच्या शिखराची नव्याने बांधणीकेली असून सुंदर रंगकाम केले आढळते. मंदिराच्या आसपास काही पुरातन मुर्त्या देखील ठेवल्या आहेत. त्यामध्ये पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेली शिवमूर्ती म्हणजे गौरीहराची मूर्ती, महिषासुरमर्दिनी आणि दुर्मिळ अशी चतुरलिंगी शिवपिंड अवश्य बघावी.

नातेपुते गावाच्या दक्षिणेला, ओढ्याच्या पलीकडे साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर छोट्या टेकडीवर श्रीपर्वतेश्वर हे निसर्गरम्य शिवालय आहे. मंदिर बांधकामाचा ऐतिहासिक कालावधी निश्चित सापडत नाही. परंतु मूळ गाभार्याचे बांधकाम, तटबंदी प्राचीन असून सभामंडपाचे बांधकाम मात्र शंभर वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराच्या थोडेसे दक्षिणेला ज्योतिबा तर आग्नेयेला सिद्धनाथ ही दोन छोटी मंदिरे आहेत. गावकरी श्रावणातील नागपंचमी उत्सव/सण दरवर्षी पर्वतेश्वराच्या मंदिराजवळ साजरा करतात. अलिकडे त्यास गावजत्रेचे स्वरूप आलेले आहे. त्या दिवशी त्या ठिकाणी नागोबा देवतेची प्रतीकात्मक पूजा नाभिक समाजातील राऊत कुटुंबीय करतात. गावकरी त्याचे दर्शन घेतात. त्यानिमित्ताने मंदिरातील परिसरात महिलांचे पारंपरिक खेळ, युवक व बालकांचे पतंगोत्सव, मैदानी खेळ; तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. सर्व प्रकारची खेळणी, मेवामिठाई यांचा आस्वाद गावकरी निसर्गसान्निध्यात घेतात.
श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी ग्रामदैवत गौरीहराच्या मंदिरात गावकऱ्याच्या वतीने महाप्रसाद भंडार्याचे (अन्नदान) व सायंकाळी महादेव आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन ग्राम पंचायत व नातेपुतेकर ग्रामस्थ यांच्या मार्फत केले जाते.
बळी मंदिराच्या बाहेरही दोन वीरगळी अर्ध्या जमिनीमध्ये गाडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. ह्या दोन हेमाडपंथी पुरातन मन्दिराखेरीज नातेपुते गावातील आवर्जून बघावे असे अजून एक मंदिर म्हणजे पर्वतेश्वर मंदिर. एका छोट्या टेकाडावर बांधलेले हे शिवमंदिर सुमारे शंभर वर्षापूर्वीचे असावे. मंदिरापर्यंत जायला उत्तम पायरीमार्ग आहे. कमानींमधून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूला पुरातन देवड्या दिसतात आणि दोन उंच दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा सभामंड्प लाकडी खांबांवर बांधलेला असून गाभाऱ्यामध्ये शाळुंका असलेली शिवपिंड आहे.
जैन धर्मीयांनी चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर मुख्य पेठेत 1921 साली बांधले. त्या ठिकाणी 1008 भगवान श्री आदिनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराचा जीर्णोद्धारही अलिकडील काळात करण्यात आला. जैन समाज गुजरात-राजस्थान या भागातून उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात दोन-तीनशे वर्षांपूर्वी आला. तो समाज व्यापार-उद्योगधंद्यात स्थिर व यशस्वी आहे. नातेपुते गावास व्यापारी पेठ म्हणून जो लौकिक प्राप्त आहे त्यात त्या समाजाचा वाटा मोठा आहे.
गावातील सधन व प्रतिष्ठित शंकरराव घुगरदरे, रघुनाथराव घुगरदरे, रघुनाथ इंगोले, मोहिनीराज ख्रिस्ती व गावकरी यांनी मिळून श्रीराम मंदिराची उभारणी व मूर्ती प्रतिष्ठापना शके 1848 मध्ये केलेली आहे. गावातील व्यापारी खंडो रामजी सोनवळ यांनी रामपंचायतनाच्या सुंदर व संगमरवरी मूर्ती दान म्हणून दिल्या. पूर्वीचे राम मंदिर गिरिजापती मंदिराजवळ होते. ते कालौघात नष्ट झाले. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या गिरवी या आजोळी जात असताना सध्याच्या पेठेतील जागा राम मंदिरासाठी योग्य आहे असे गावकर्यांना सुचवले. त्यानंतर मंदिर उभारणी झाली. राम मंदिर व शेजारील मंडईतील हनुमान मंदिर यांचा ट्रस्ट 1993 साली केला गेला. मंदिराचा जीर्णोद्धार 1999 साली केला गेलेला आहे. गावचे कै. नरहर बंदिष्टे यांच्या घराण्यात प्रथमपासूनच दैनंदिन पूजा व उत्सव यांचा मान आहे.
बलखंडी गणेश मंदिर, साखरबावी विहीर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर नातेपुते गावाच्या नैऋत्य दिशेला जुन्या वेशीबाहेर गावाच्या ओढ्याकाठी श्री पर्वतेश्वर रस्त्यावर आहेत. मंदिर प्रमाणबद्ध चौकोनी आकारात ताशीव व घडवलेल्या दगडात आणि चुन्याने बांधलेले आहेत. वर गोल घुमट आकार व कळस आहे. दगडी सुंदर नक्षीकाम व रेखीव मूर्ती कोरलेल्या आहेत. तशा प्रकारची व आकाराची दोन मंदिरे सांगली संस्थानच्या मुख्य गणपती मंदिराशेजारी आहेत. गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची संगमरवरी दगडाची रेखीव व सुंदर आहे. त्या ठिकाणी मंदिरात एक व बाहेर एक अशी दोन समाधिस्थाने आहेत. मंदिरात असलेली दगडी समाधी ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे गणेशभक्त बलखंडी महाराजांची आहे. त्यांनीच ती गणेशमूर्ती स्थापलेली आहे असे म्हणतात. म्हणून ते समाधिमंदिर असे ओळखले जाते.
मूळ मूर्ती 1970 च्या आसपास भंगली, त्यामुळे गावकर्यांनी जयपूरहून (राजस्थान) मूर्तिकारांना आणून मूळ मूर्तीच्या साच्यावरून हुबेहूब संगमरवरी मूर्ती तयार करून घेतली व तिची प्राणप्रतिष्ठा केली. मूळ मूर्ती समुद्रात विसर्जित केली.
मंदिराच्या जमिनीचे मालक अतुलशेठ बावकर यांच्यातर्फे गणेश जयंती व गणेशोत्सव हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. दररोजची पूजाअर्चा श्रीधर कुलकर्णी परंपरेने पाहतात.
श्री भवानी माता मंदिर हे छोटे पण टुमदार मंदिर नातेपुते गावाच्या पश्चिमेला ऐतिहासिक बुरुजाजवळ छोट्या टेकडीवर आहे. गावाच्या मुख्य वतनदाराचा वाडा त्या ठिकाणी पूर्वी होता व जवळच गावाची वेस होती. भैरवनाथाचे मंदिर ओढ्याजवळ होते. त्या देवस्थानची जमीन पैठणकरांकडे आहे.मंदिरातील भवानीदेवीची संगमरवरी मूर्ती प्रसन्न व मनोहर आहे. तिचीही पुनर्स्थापना व मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, कारण जुनी मूर्ती भंगली. माजी सरपंच कै. नानासाहेब देशमुख यांनी ते काम केले. त्यांच्या पुढील पिढ्यांकडून दैनंदिन पूजाअर्चा व्यवस्थेचे काम ब्राह्मण पुजार्यांकडून केले जाते.
या मंदिराच्या व गिरिजापती, पर्वतेश्वर या जुन्या ऐतिहासिक मंदिरांच्या समोर भग्न सतिशीळा, वीरगळ, भग्न मूर्ती व गद्धेगळ पाहण्यास मिळतात.
साखरबावी ही भलीमोठी चिरेबंदी विहीर पर्वतेश्वर मंदिरास पश्चिमेकडील पाणंदीतून जाताना ओढ्यानजीक तुटलेल्या रहाटासह दिसते. बाव, बावी म्हणजे विहीर आणि तिचे पाणी साखरेसारखे गोड म्हणून ती साखरबावी. सातारा जिल्ह्यातील धावडशीचे राजगुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक ठिकाणी विहिरी खोदल्या व बांधल्या. त्यांपैकी ती एक सुंदर विहीर आहे व ते इतिहासातही नमूद केलेले आहे. विहिरीला खूप व चांगले पाणी आहे. तिचे पाणी कोणत्याही मोठ्या दुष्काळात आटले नाही वा कमी पडले नाही. नातेपुते गावाला पिण्याच्या पाण्याचा तोच मुख्य स्रोत 1960 पर्यंत होता. सर्व गाव साखरवाबी व तिच्याच पूर्वेला थोड्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक पांडुरंगाच्या मंदिरासमोरील आडाचे पाणी पित होते. त्याकाळी ओढाही बारा महिने वाहत होता. कालानुरूप ग्राम पंचायतीने तेथे टाकी बांधली, इंजिन-पंप बसवले व त्यानंतर 1970 च्या दशकात नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. गावाची लोकसंख्या वाढली. साखरबावी ग्राम पंचायतीची की खाजगी मालकीची या वादात अडकली व तिच्याकडे दुर्लक्ष झाले. विहिरीच्या उत्तरेला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. ते समर्थ स्थापित आहे असे म्हटले जाते. त्या मंदिराच्या खालून साखरबावीस मोठा पाण्याचा झरा आहे.
इंदूरचे राजे होळकर संस्थानची जागा, दस्तऐवज व महादेवाला वाहिलेली प्रचंड मोठी मानाची कावड व त्यास पंचधातूचे मोठे हंडे येथील चांगण कुटुंबीयांकडे होते. चैत्र महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर त्या कावडीने पाणी ग्रामदैवत गौरीहराला वाहिले जाई. ती प्रथा चालू आहे. नातेपुते गावाचा ऐतिहासिक वारसा शोधण्याचा प्रयत्न उपलब्ध ऐतिहासिक वास्तू, त्यांचा काळ, पारंपरिक कल्पना, गावातील ज्येष्ठ व जाणत्या व्यक्ती यांच्याशी चर्चा यामधून केला आहे. परंतु प्रत्यक्षात लेखी दस्तऐवज कोठेच नाही. काही ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथ आणि प्राचीन मंदिरे व पडक्या वास्तू या आधारे शोध करावा लागते. नातेपुते गावाचा उल्लेख सुमारे बारा-चौदा ऐतिहासिक महत्त्वाच्या ग्रंथांत आलेला आहे. त्यावरून ऐतिहासिक काळापासूनचे गावाचे महत्त्व लक्षात येऊ शकते.
शिखर शिंगणापूर - नातेपुते घाटात एतिहासिक लोककल्याणकारी हेतुने बांधलेली बारव.
शिवलिंगाच्या आकाराची सह्याद्रीच्या घाटामधे वाटसरुंना शितल पाण्याने तृप्त करणारी ही बारव बांधली आहे होळकर घराण्याची कर्तबगार स्त्री ,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी
गेल्या शेकडो वर्षात प्रखर उन्हाळ्यात ही यातले पानी कधी आटले नाही.
पण आपले दुर्भाग्य असे की आता याची एक शिळा निसटली आहे आणि या एतिहासिक वारशाला ग्रहण लागले आहे.
लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, व्यापार व घोंगडी तयार करणे असा होता. शेतमालाची मोठी बाजारपेठ म्हणून पूर्वीपासून नातेपुते प्रसिद्ध आहे. (सोलापूर जिल्हा गॅझेट, 1884). नातेपुते गावच्या परिसरातील चाळीस-पन्नास खेड्यांचा व्यापारउदीम, देवाणघेवाण नातेपुते बाजारपेठेत होतो. शेतमालाबरोबरच कापड, किराणा व भुसार माल, सोने-चांदी व फर्निचर या क्षेत्रांत तेथील व्यापार्यांनी मोठी भरारी घेतलेली आहे व फार मोठी आर्थिक उलाढाल त्या क्षेत्रात होते. नातेपुते गावचा आठवडी बाजार दर बुधवारी असतो. तो मोठा व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते. माल व प्रवासी वाहतूक यासाठी खाजगी सर्व प्रकारच्या गाड्या तेथे उपलब्ध आहेत. शेतीही आधुनिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे गावचे लोक कष्टाळू, उद्योगी व स्वयंभू; तसेच, समाधानी व सुखी आहेत.
गावात कापसाच्या आठ जिनिंग फॅक्टरी 1960 ते 1980 च्या काळात दिवसरात्र चालत होत्या. त्यामुळे रोजगार भरपूर होता. त्याकाळी नातेपुते ही मोठी बाजारपेठ शेंग-गूळ-कापसाची होती.
सद्यस्थितीत बराचसा नोकरवर्गही गावात स्थायिक झालेला आहे. स्वतंत्र आधुनिक बंगले व कॉलनी यांमुळे गावचे रूप पालटून गेलेले आहे. नातेपुते गाव पुणे-पंढरपूर रस्त्यावर असल्याने व शेजारी परिसरात वाडीवस्त्या व खेडी यांची संख्या जवळजवळ पंचवीस-तीस असल्याने रोज मोठे दळणवळण होत असते. तेथून सुमारे दीडशेभर एस.टी. बसगाड्यांची रोज ये-जा होत असते. त्याचा परिणाम म्हणून नातेपुते गावचे शहरीकरण-नागरीकरण वेगाने होत आहे व त्यामुळे तेथील जमिनींचे बाजारभाव खूप चढे आहेत.
नातेपुते गावाला पूर्वी ऐतिहासिक साखरबावी विहीर व पांडुरंगाच्या मंदिराशेजारचा आड यांचे पाणी पिण्यासाठी वापरात होते. पाऊसपाणी नियमित असल्यामुळे गावचा ओढा बारा महिने वाहत असे. त्यामुळे दुष्काळातही पाणी कमी पडत नसे. गावाला सॅण्ड फिल्टरेशनची चांगली पाणीपुरवठा योजना ग्राम पंचायतीच्या माध्यमातून 1970 च्या आसपास सुरू झाली. तिचे विस्तारीकरण होत आहे. तसेच नातेपुतेच्या इशान्य बाजूने ब्रिटिशांनी बांधलेला नीरा उजवा कालवा गेला आहे. त्यापुढे भोर तालुक्यात असलेल्या नीरा-भाटघर-देवधर-गुंजवणी या धरणांमुळे पंढरपूरपर्यंतचा भाग सुजलाम् सुफलाम् झालेला आहे. नातेपुते गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या जुन्या तळ्यात नीरा उजव्या कॅनॉलचे पाणी साठवले जाते. ते टाक्यांमधून फिल्टरेशन व निर्जंतुकीकरण करून गावाला नळावाटे दिले जाते. ग्राम पंचायतीला नागरिकांना सुमारे आठ लाख लिटर पाणी दिवसाला पुरवावे लागते. गाव पाण्याबाबत पूर्वीपासून सुखी व समाधानी आहे. नातेपुते गावाची पाणीपुरवठा योजना राज्यात आदर्श अशी मानले जाते.
नातेपुते ग्रामपंचायतीची स्थापना 1933 साली झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ’ ही संस्था पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. कालांतराने आणखी तीन खाजगी सहकारी शेतकरी सोसायट्या निर्माण झाल्या. सध्या पाच राष्ट्रीकृत बँका, सहा नागरी सहकारी बँका व अकरा सहकारी पतसंस्था, साठ महिला बचत गट व अनेक खाजगी फायनान्स कंपन्या गावात कार्यरत आहेत. मार्केट कमिटीत मोठा व्यापार होतो.
नातेपुते गावात सरकारी अद्ययावत ग्रामीण रुग्णालय, चोवीस खासगी दवाखाने व तज्ज्ञ सात डॉक्टर आहेत. गावात बालवाडी ते कॉलेज व व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बालवाडी ते बारावीपर्यंतच्या तीन खाजगी संस्था, एक महाविद्यालय, एक आय.टी.आय. तर पंचवीस सरकारी अंगणवाड्या सुरू आहेत. त्यांचा लाभ परिसरातील वीस-पंचवीस खेड्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना होतो. ग्रामपंचायत सार्वजनिक वाचनालय मोठे व चांगले आहे. त्यात सुमारे पंधरा हजार ग्रंथ आहेत.
गावात सुंदर व प्रशस्त ग्राम पंचायत कार्यालय, तलाठी व सर्कल कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, वीज उपकेंद्र कार्यालय, सार्वजनिक बांधकाम व इरिगेशन कार्यालय व कॉलनी, टपाल व दूरध्वनी कार्यालय, स्वतंत्र पोलिस ठाणे, एस.टी. स्टॅण्ड अशी अनेक सरकारी कार्यालये व तेथील कर्मचाऱ्याच्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत
पुणे-सातारा शहरापासून जर तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार अशी एक दिवसीय छोटी, शांत, निवांत अशी सहल आयोजित करायची असेल तर नातेपुते आणि परिसर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एखाद्या आधीच प्रसिद्ध असलेल्या गजबजलेल्या, गर्दीच्या ठिकाणी सहलीला जाण्याऐवजी कधीतरी वाकडी वाट करून अशा आडवाटेवरील कमी विख्यात जागेला देखील भेट द्यावी. खास करून दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी व्यक्तींनी तसेच ज्यांना पुरातन मंदिरे, वीरगळी, स्मारके बघायची आवड असेल त्यांना तर नातेपुते परिसरातील मंदिरे आणि किल्ले म्हणजे एक उत्तम पर्वणी ठरेल.
किल्ले टेंभुर्णी :-
मोहोळचा किल्ला :-
सांगोला भुईकोट :-
सोलापूरपासुन ८२ कि.मी व पंढरपूरपासुन ३१कि.मी.अंतरावर वर सांगोला हे तालुक्याचे ठिकाण वसले आहे. मध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक आहे. मध्ययुगीन कालखंडात सांगोला हे भरभराटीला आलेले शहर होते व त्याची ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले व किल्ला पुर्णपणे बेचिराख झाला. आज किल्ला प्रत्यक्षात अस्तित्वात नसुन केवळ वास्तूंच्या आधारे किल्ल्याची स्थाननिश्चिती करावी लागते.जुन्या कागदपत्रातील वर्णनानुसार सांगोला शहराभोवती असणारी तटबंदी म्हणजेच नगरकोट व शहराच्या मध्यभागी असणाऱ्या छोट्याशा टेकडीवर असणारी तटबंदी म्हणजेच बालेकिल्ला अशी याची रचना होती. वाढत जाणाऱ्या सांगोला शहरामुळे नगरकोट व त्याच्या खाणाखुणा पुर्णपणे नामशेष झाल्या असुन मध्ययुगीन कालखंडाशी नाते सांगणारी केवळ एक पायऱ्या, कमान व ओवरी असणारी बारव मोरया गल्लीत दिसुन येते तसेच शिवाजी चौकासमोर असणाऱ्या मंडईत वेशीच्या दरवाजाशेजारी तटबंदीची भिंत काही प्रमाणात दिसते.
या बुरुजाच्या पुढे काही अंतरावर सहा फुट उंचीच्या चौथऱ्यावर उभारलेली जुनी दगडी मस्जिद दिसुन येते. या चौथऱ्याखालील भागात दोन ओवऱ्या असुन एक कोठारवजा खोली दिसुन येते. हा भाग मस्जिदच्या ताब्यात असल्याने आत जाता येत नाही.

या चौथऱ्यासमोरच चुना मळण्याचे दगडी चाक दिसुन येते पण घाणा दिसत नाही. काळाच्या ओघात तो नष्ट झाला असावा.

याच्या पुढील भागात ब्रिटीशकालीन कोर्टाची इमारत असुन या इमारतीच्या मागील बाजुस किल्ल्याची गडदेवता म्हणजेच क्षेत्रपाल म्हसोबाचे देऊळ आहे.
देवळाकडून वाटेने सरळ गेल्यावर उजव्या बाजुला बालेकिल्ल्यास पाणीपुरवठा करणारी पायऱ्यांची चौकोनी बारव आहे. या बारवमध्ये उतरणाऱ्या पायऱ्यांच्या शेवटी एक कमान असलेला दरवाजा आहे.

विहिरीच्या खालील बाजुला उजवीकडे नरसिंहाचे छोटेसे घुमटीवजा लाल रंगात रंगविलेले मंदिर आहे. बालेकिल्ल्याचे आजमितीस इतकेच अवशेष शिल्लक असुन नगरकोटचे व बालेकिल्ल्याचे सर्व अवशेष पहाण्यास एक तास पुरेसा होतो. सांगोला किल्ला आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून गडावरील मशीद त्याच काळात बांधली गेली आहे. तत्कालीन कागदपत्रानुसार सांगोला एक भरभराटीचे शहर असुन त्याची ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. इ.स.१६८६ मध्ये आदिलशाही नष्ट केल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला व १७०७मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंमहाराज यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छत्रपती शाहूंनी केलेल्या सनदेनुसार राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव यांच्याकडे आला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजीं पेशवे यांच्याविरूद्घ बंड पुकारले पण सदाशिवराव भाऊनी हे बंड उखडुन सांगोल्यावर पुन्हा पेशव्यांची सत्ता स्थापन केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत (१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते पुर्णपणे उद्ध्वस्त केले. पेशवाईच्या अस्तानंतर सांगोला इंग्रजी अंमलाखाली आले व सांगोला येथे संपुर्ण महाराष्ट्रातील दुसरी नगरपालिका स्थापन झाली.
१) सोलापुर जिल्हा गॅझेटीयर
२) स्थलकाल- अरुण टिकेकर
३) https://thinkmaharashtra.com/
४)
५)
६)
७)
८)
९)
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्हा हा तिथे असलेले मजबूत भुईकोट किल्ले/गढी यांसाठी ओळखला जातो. इतिहासातील अनेक नामवंत सरदार पदाधिकारी यांच्या गढया जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळतात. त्यांचे अवशेष काही प्रमाणात आजही त्यांच्या ऐतिहासिक पणाची साक्ष देत आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
सोलापूर-पुणे
महामार्गावर सोलापूर पासून सुमारे तीस कि मी अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे
गाव आहे. गावामध्ये प्रवेश करताच नागनाथ मंदिर विचारताच आपल्याला लगेच
उत्तर मिळते कारण कोट किंवा किल्ला असे कोणतेही सलग अवशेष आपणास आज पहावयास
मिळत नाहीत. नागेश्वर मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावरूनच मंदिराच्या
प्राचिनतेची साक्ष पटते. मंदिराचे दगडी बांधकाम कलात्मकतेने रंगविले झाले.
प्रवेशद्वारावर नगारखान्याची रचना केलेली आहे. मंदिर पाहून बाहेर आल्यावर
डावीकडे आणखी दोन मंदिरे दृष्टीस पडतात. त्यांच्या परिसरात वीरगळी मांडून
ठेवल्या आहेत. याच वाटेने पुढे गेल्यास डाविकडे कोटाचे प्रवेशद्वार दृष्टीस
पडते. दोन बाजुंना बुरुज आणि पडलेली तटबंदी आहे. याच वाटेने पुढे उजवीकडे
गेल्यावर जमिनीस समांतर अशी एक बारव दिसते. बारवेच्या आत उतरण्यासाठी
पायऱ्या असून चारही बाजुंनी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. बारवेच्या वरील बाजूस
पाणी बाहेर खेचण्यासाठी दोन मोटांची सोय केलेली दिसते. बारवे तील पाणी
पिण्यायोग्य नाही. याला लागूनच कबरींचे काही अवशेष पाहायला मिळतात.याच
रस्त्याने पुढे डावीकडे जुन्या घुमटीचे अवशेष नजरेस पडतात. यावरून
किल्ल्याच्या मध्ययुगीन बांधकामाची कल्पना येते. आल्या वाटेने आपण आधी
पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येऊन त्यातून पायऱ्यांच्या
रस्त्याने सरळ बालेकिल्ल्याकडे जाता येते. पुढे काही अंतरावर देशमुखांचा
वाडा पहावयास मिळतो. गावात याशिवाय भानेश्वराचे जुने मंदिर पाहण्यासारखे
आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर - पुणे महामार्गावर मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण सोलापूर पासून ३५ किमी अंतरावर आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मोहोळचा किल्ला
पुणे-सोलापूर रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ५६ कि.मी.अंतरावर तर सोलापुरपासून ३५ कि.मी. अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे गाव आहे. गाव फार जुने असुन मराठा कालखंडात मोहोळ येथे सुभ्याची कचेरी होती. येथे एक भुईकोट किल्ला आहे असे म्हणण्याऐवजी होता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज आपल्याला किल्ला सलग असा पहाता येत नाही तर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कोटाचे विखुरलेले अवशेष पाहावे लागतात. मोहोळ गावात किल्ला म्हणुन विचारले असता गावकऱ्याना ठोसपणे सांगता येत नाही म्हणुन किल्ल्याऐवजी नागनाथ मंदीर विचारावे व तेथुन किल्ला पहाण्यास सुरवात करावी. गावाबाहेर ओढ्याच्या काठी प्रशस्त असे नागनाथ मंदीर असुन या भागात बरेचसे अवशेष पहायला मिळतात. मध्ययुगीन बांधकामाची साक्ष देणाऱ्या नागनाथ मंदिराभोवती दगडी तटबंदी असुन संपुर्ण तटबंदीत ओवऱ्या आहेत. मंदीराचे दगडी बांधकाम सुबकतेने रंगविलेले आहे. मंदिराचे बांधकाम किल्ल्याप्रमाणे असुन दरवाजावर नगारखाना आहे. मंदिरासमोरील वाटेने पुढे जाताना अजुन दोन नव्याने बांधलेली मंदीरे दिसतात. मंदिरे जरी नवीन असली तरी मंदिराच्या आवारात विरगळी व प्राचीन मुर्ती आहेत. यातील एका मंदिराबाहेर राशीचक्राचे दुर्मीळ शिल्प आहे. वाटेच्या शेवटी डाव्या बाजुला दोन बुरूजात बांधलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार व शेजारी ढासळलेली तटबंदी दिसते तर उजव्या बाजुस जमीनीशी समांतर एक भली मोठी चौकोनी बारव आहे. हि बारव खर्गतीर्थ म्हणुन ओळखली जाते. या बारवमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असुन आत चारही बाजुला ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या कोनाड्यात विरगळ व शिल्पे ठेवलेली आहेत. बारवच्या वरील बाजुस पाणी खेचण्यासाठी दोन दगडी मोटा असुन पाणी वाहण्यासाठी दगडी पाट बांधलेला आहे. बारवच्या समोरील बाजुस एका चौथऱ्यावर झुडुपात दगडात कोरलेल्या सहा कबरी दिसतात. हे पाहुन झाल्यावर आपण आधी पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे निघायचे. या दरवाजातून आपण सरळ बालेकिल्ल्याकडे जातो. मोहोळचा किल्ला नगरदुर्ग या प्रकारातील असुन संपुर्ण गावाभोवती तटबंदी व आत खाशा लोकांसाठी तटबंदी व बुरूज असलेली गढी किंवा बालेकिल्ला अशी याची रचना असावी. कधीकाळी मोहोळच्या भुईकोटाच्या बाहेरील तटबंदीत एकुण नऊ दरवाजे होते पण आज मात्र गावाच्या खालील बाजुस आपण प्रवेश केलेला म्हणजेच दक्षिण दिशेला असणारा किल्ल्याचा मुख्य दरवाजा व ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. कोटाचे तीन बुरूज व दोन बाजुची तटबंदी सध्यातरी काही प्रमाणात पहायला मिळतो. बालेकिल्ल्याच्या तटबंदीतील भागात देशमुखांचा वाडा आहे. बालेकिल्ल्याचा दरवाजा वाड्याच्या दरवाजाप्रमाणे बांधलेला असून चांगल्या स्थितीत आहे पण आतील दालन मात्र अलीकडे ढासळलेले आहे. दरवाजातील प्रवेश L आकारात असुन दुसऱ्या दरवाजाच्या आतील उजव्या बाजुस तळामध्ये कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे. बालेकिल्ल्याला एकुण चार बुरूज असुन तीन ढासळलेल्या अवस्थेत आहेत तर चौथा बुरूज व त्या बाजुची तटबंदी वाटेत येत असल्याने नगरपालिकेने २०१६ साली पाडून टाकली. याशिवाय मोहोळमध्ये अकराव्या शतकातील चालुक्यकालीन भानेश्वर हे शिवमंदीर आहे. मंदिराची पडझड झाली असली तरी त्यावरील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. मोहोळच्या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी स्थानिक देशमुखांच्या सांगण्यानुसार या किल्ल्याची बांधणी राजाराम महाराजांच्या काळात झाली व जिंजीला जाताना त्यांनी मोहोळ येथे एक दिवस मुक्काम केला होता पण याला ठोस पुरावा नाही. गावात आढळणारे अवशेष मात्र मोहोळच्या प्राचीनतेची साक्ष देतात.
मोहोळ परगणाचे गायकवाड़ देशमुख
औरंगजेब बादशहा च्या इस्लाम पुरी तळावरील तसेच पुढील मोहिमेवर " भास्करराव हरकारा " याचा उल्लेख पुन्हा. पुन्हा येतो.
भास्करराव हरकारा स्वत तर बादशहा च्या सेवेत होताच. शिवाय त्यांची दोन मुलें किशनराव .व शंकरराव ही बादशही सेवेत जुलैच्या य1694 ले हजार झालीहोती.
भास्करराव हरकारा यास या भागातील रास्त. मार्ग.किल्ले. गडकोट यांची चागंली माहिती असावी असे दिसते .बादशहा सन 1699 च्या नोव्हेंबरात पन्हाळगडच्या वाटेवर होता.अध्याप तो या गडावर पोच झालेला नव्हता. बादशहा औरंगजेब आमणपूर . ( ताराबाईसाहेब.तास गाव .जिल्हा सांगली )येथे होता.त्यांस भास्कररावाला पन्हाळागड किती दूर आहे याची विचारणा केली. त्यावेळी भास्कररावाने पन्हाळगड 9 कोसावर आहे अशी माहिती औरंगजेब बादशहाला दिली .
हिच गोष्ट पुढे वसंतगडचे अंतर किती आहे असे बादशहा ने भास्कर राव यांना विचारले .यांवरून भास्कर राव हरकारा यांना त्या भागाची भौगोलिक माहिती चागंली होती असे दिसते .बादशहाने पुढे सातारगडाचे मोर्चा लावले .हे मोर्चा आणि त्या जागा कोणत्या बाजूला आहेत यांची माहिती भास्कररावनेच बादशहाला त्याने विचारणा केल्याने य5 डिसेंबर 1699 ला दिलेली आहे असे उल्लेख आहे. भास्करराव हरकारा यास 21 जुलै 1700 रोजी औरंगजेब बादशहा च्या नाराजीचाही सामना करावा लागला .परशुरामपंत प्रतिनिधी व रामचंद्रपंत अमात्य यांची वकील शहाजादा आज्जमकडे गुप्त वाटाघाटी करण्यासाठी आले.अशी वाटाघाटींना शहाजादाने नकार दिला .या वकीलांना त्यांनी छावणी बाहेर केले .सदर वकील हे भास्करराव च्या छावणीत गेले व भास्करराव यांना त्यावेळी आपल्या छावणीत आशय दिला .ही गोष्ट औरंगजेबाला त्याच्या गुप्त हेरा कडुन समजली तेव्हा त्यांना भास्करराव हरकारा यांचा 200 शी चे मनसबदारी होते औरंगजेबानी 50 ने कमी केला .कारण मराठयाचे वकील भास्करराव हरकारा यांचा आपल्या घडित ठेऊन घेतील पन्नास नेतृत्व कमी केला .खरी तरे महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मार्गदर्शना खाली वरीलपैकी वकील वाटाघाटी साठी आलेत यां वकीलना भास्करराव यांना आपल्या छावणीत आशय कशासाठी दिला कोण होते भास्करराव हरकारा हे पुढील देऊ पण वाटाघाटी करून झुलफखराखान यांना रायगडावर महाराणी युसेबाई व बाल शाहू व महाराणी सकवारबाई ( छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी ) कैदी होत्या त्यांच्या सुटकेसाठी वरील वकील गुपचुप औरंगजेबच्या छावणीत आलेत .भास्करराव यांना घालावे शिक्षाबाबत सियादतखान मध्यस्थी केला भास्करराव निरापराध आहे असे सागंतील तेंव्हा भास्कर राव माझ्या सोबत राहिल असे फर्मान औरंगजेबानी सोडले .बादशहा चा मुक्काम समय (येरला) ई ला नदीवर .आबंवडा .येथे होता .
बादशहा ए मुक्कामाला पुढे निघणेपुर्वी पुढील मुक्काम कोठे करावयाचा यांचाही सल्ला भास्करराव हरकारा कडुन घेत. विशालगडास मोहिम संपवून औरंगजेब बादशहा माघारी फिरवला .23 जून 1702 रोजी मलकापुर येथे पावसामुळे मुल फौजा व बादशहाचे हाल हाल झाले .बादशहा चा शय्यागृहाचा तंबू पावसाने गळू लागला .बादशहा च्या अंगावर पाऊस चे पाणी आले रात्री भर जागरणे केली .नोकर लोकांना तंबू च तणाव मजबूत बाधंल्या नाही म्हणून हमीदुदीनखान यांना शय्यागृहाच्या तणाला स्वतःच ओढून मजबूत बांधला. हमीद्दुदीनखान वर नाराजी होऊन बादशहा ने भास्करराव हरकारा यास विचारले की पावसाचा त्रास होणार नाही असे पुढील मुक्कामाचे ठिकाण कोणते हे सुचविण्यासाठी सागंतील तेव्हा भास्करराव हरकारा यांना सोयीची होतील अशी तीन ठिकाणे बादशहा ला 24जून 1702 रोजी कलविले.
भास्करराव हरकारा यास मराठा सैन्याच्या हालचाली कशा चालू आहेत याबाबत च्या गुप्त बातम्या औरंगजेब बादशहास पोच करण्याची कामगिरी करावी लागते .त्या साठी स्वतंत्र असे 250 चे "जात "ची मनसब वेगळी होती.भास्करराव हरकारा अशा मराठ्याचे सैन्याच्या हालचाली बाबत माहिती देत नाहीत अशी तक्रारी डिसेंबर 1702 ला औरंगजेबा कडे आली .बादशहा ने अशा तक्रारीची दखल घेतली व भास्करराव हरकारा यांचा मनसब 50 ने कमी केला .भास्करराव हरकारा यांचा मुलगा किसनराव याची हरकाराच्या कामावर (बातम्या लिहून पाठविणारा) कामावर बादशहाने तैनात केला .दुसरा मुलगा शंकर राव याची मनसब वाढविण्यात आले भास्करराव हरकारा यास 250 स्वाराची मनसब होती . मोहोळ परगाणा त्याकाळी मंगळवेढा च्या किल्लेदार मुहंमद आकील यांच्या कक्षेत हा परगाणा होता. किल्लेदार मुहंमद आकील यांना भास्करराव हरकारा याने मोहोळ परगाणासाठी मागाणी केली .या मागाणीवर औरंगजेब बादशहानी मोहोळ परगाणा भास्करराव हरकारा यास तनखा य ( पगार ) जहागीर म्हणून 4 आगॅस्ट 1703 रोजी दिला होता . बादशहाने भास्करराव हरकारा यांची तैनात औरंगाबाद सुभ्यात केली असता .त्याच ठिकाणी 25 जानेवारी 1704 रोजी निधन पावला . यावेळी त्याचा मुलगा बादशहाने बोलावून पाठिवले . व मोहोळालाा जहागिर येथे अत्यंविधी झाले .भास्करराव हरकारा यास आणखी एक मुलगा कृष्णा त्यास ही औरंगजेब बादशहाने बोलावून घेतले .त्यास भास्करराव यांच्या निधना नंतर 26 आगॅस्ट 1704 रोजी 4 होन बक्षीस दिले ...........
भास्करराव हरकारा कोण ?
भास्करराव हरकारा गायकवाड घराण्यातील असावा .शिवाय छत्रपतींच्या राणीसाहेब " सकवारबाई" गायकवाडांच्या घराण्यातील होत्या . या दोघांचे जवळचे अथवा दूर चे नाते संबंध असावेत . कारण सकवारबाई इस्लामपुरीच्या तळावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराजांच्या सोबत होत्या . समाधी - आज मोहोळ बसस्थानकाच्या पाठिमागे देशमुखांच्या शेतात इस्लामी पध्दतीने बांधकाम केलेले भास्करराव हरकारा यांची समाधी आहे .या समाधीचे स्थानिक लोक राजे भास्कर ची समाधी म्हणून मानतात . सदर समाधीची उंची 20 फुट असुन लांबी 25 फुट रूंदी 20 फुट आहे तर जाथ 4 फुट चे आहे . सदर समाधीअवस्था आज आता व बाहेरून मस्जीद सारखे कशीसाठी असे बघितले वर मला वाटते उत्तर - भास्करराव हरकारा च्या निधनानंतर औरंगजेब बादशहा च्या फर्माना नुसार हे समाधी बादशहा खर्चाने बाधली तसेच सदर जहागिर भास्करराव हरकारा यांची असेल तर समाधी बादशहा व मोहोळ परगाणा मंगलवेढाचे किल्लेदारच्या देखरेखी खाली झाले असेल्या म्हणून समाधी इस्लामी पध्दती नुसार आत व बाहेरून वाटते .
सदर समाधीचे फोटो इतिहासातील नोंद नुसार मी संतोष झिपरे यांना आमचे मित्र श्री .सुदर्शन मोरे ( वडील .तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ) सागंतील व समाधीचे फोटो उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार सुदर्शन मोरे
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळ सोलापूर संस्थापक मनोज भाऊ शिंदे सोलापूर संतोष झिपरे 9049760888 पुर्ण माहिती व लेख
संतोष झिपरे 9049760888
मोहोळ
प्रकार : नगरकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पुणे-सोलापूर
रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ५६ कि.मी.अंतरावर तर सोलापुरपासून ३५ कि.मी.
अंतरावर मोहोळ हे तालुक्याचे गाव आहे. गाव फार जुने असुन मराठा कालखंडात
मोहोळ येथे सुभ्याची कचेरी होती. येथे एक भुईकोट किल्ला आहे असे
म्हणण्याऐवजी होता असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. आज आपल्याला किल्ला सलग
असा पहाता येत नाही तर त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी कोटाचे विखुरलेले अवशेष
पाहावे लागतात. मोहोळ गावात किल्ला म्हणुन विचारले असता गावकऱ्याना ठोसपणे
सांगता येत नाही म्हणुन किल्ल्याऐवजी नागनाथ मंदीर विचारावे व तेथुन किल्ला
पहाण्यास सुरवात करावी. गावाबाहेर ओढ्याच्या काठी प्रशस्त असे नागनाथ
मंदीर असुन या भागात बरेचसे अवशेष पहायला मिळतात. मध्ययुगीन बांधकामाची
साक्ष देणाऱ्या नागनाथ मंदिराभोवती दगडी तटबंदी असुन संपुर्ण तटबंदीत
ओवऱ्या आहेत. मंदीराचे दगडी बांधकाम सुबकतेने रंगविलेले आहे. मंदिराचे
बांधकाम किल्ल्याप्रमाणे असुन दरवाजावर नगारखाना आहे. मंदिरासमोरील वाटेने
पुढे जाताना अजुन दोन नव्याने बांधलेली मंदीरे दिसतात. मंदिरे जरी नवीन
असली तरी मंदिराच्या आवारात विरगळी व प्राचीन मुर्ती आहेत. यातील एका
मंदिराबाहेर राशीचक्राचे दुर्मीळ शिल्प आहे. वाटेच्या शेवटी डाव्या बाजुला
दोन बुरूजात बांधलेले किल्ल्याचे प्रवेशद्वार व शेजारी ढासळलेली तटबंदी
दिसते तर उजव्या बाजुस जमीनीशी समांतर एक भली मोठी चौकोनी बारव आहे. हि
बारव खर्गतीर्थ म्हणुन ओळखली जाते. या बारवमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असुन
आत चारही बाजुला ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या कोनाड्यात विरगळ व
शिल्पे ठेवलेली आहेत. बारवच्या वरील बाजुस पाणी खेचण्यासाठी दोन दगडी मोटा
असुन पाणी वाहण्यासाठी दगडी पाट बांधलेला आहे. बारवच्या समोरील बाजुस एका
चौथऱ्यावर झुडुपात दगडात कोरलेल्या सहा कबरी दिसतात. हे पाहुन झाल्यावर आपण
आधी पाहिलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे निघायचे. या दरवाजातून आपण
सरळ बालेकिल्ल्याकडे जातो. मोहोळचा किल्ला नगरदुर्ग या प्रकारातील असुन
संपुर्ण गावाभोवती तटबंदी व आत खाशा लोकांसाठी तटबंदी व बुरूज असलेली गढी
किंवा बालेकिल्ला अशी याची रचना असावी. कधीकाळी मोहोळच्या भुईकोटाच्या
बाहेरील तटबंदीत एकुण नऊ दरवाजे होते पण आज मात्र गावाच्या खालील बाजुस आपण
प्रवेश केलेला म्हणजेच दक्षिण दिशेला असणारा किल्ल्याचा मुख्य दरवाजा व
ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. बालेकिल्ल्याचे तीन बुरूज व दोन बाजुची
तटबंदी सध्यातरी काही प्रमाणात पहायला मिळतो. बालेकिल्ल्याच्या तटबंदीतील
भागात देशमुखांचा वाडा आहे. दरवाजापुढे एक घुमटी असुन त्यात एक मुर्ती
विरगळ व नागशिल्प मांडुन ठेवले आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा वाड्याच्या
दरवाजाप्रमाणे बांधलेला असून चांगल्या स्थितीत आहे पण आतील दालन मात्र
अलीकडे ढासळलेले आहे. दरवाजातील प्रवेश L आकारात असुन दुसऱ्या दरवाजाच्या
आतील उजव्या बाजुस तळामध्ये कन्नड भाषेत कोरलेला एक शिलालेख आहे.
बालेकिल्ल्याला एकुण चार बुरूज असुन तीन ढासळलेल्या अवस्थेत आहेत तर चौथा
बुरूज व त्या बाजुची तटबंदी वाटेत येत असल्याने नगरपालिकेने २०१६ साली
पाडून टाकली. याशिवाय मोहोळमध्ये अकराव्या शतकातील चालुक्यकालीन भानेश्वर
हे शिवमंदीर आहे. मंदिराची पडझड झाली असली तरी त्यावरील शिल्पे
पाहण्यासारखी आहेत. मोहोळच्या किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नसला तरी
स्थानिक देशमुखांच्या सांगण्यानुसार या किल्ल्याची बांधणी राजाराम
महाराजांच्या काळात झाली व जिंजीला जाताना त्यांनी मोहोळ येथे एक दिवस
मुक्काम केला होता पण याला ठोस पुरावा नाही. गावात आढळणारे अवशेष मात्र
मोहोळच्या प्राचीनतेची साक्ष देतात.
© Suresh Nimbalkar
सांगोला
प्रकार : नगरकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
सोलापूरपासुन
८२ कि.मी व पंढरपूरपासुन ३१कि.मी.अंतरावर वर सांगोला हे तालुक्याचे ठिकाण
वसले आहे. मध्य रेल्वेच्या कुर्डवाडी-मिरज लोह-मार्गावरील हे एक स्थानक
आहे. मध्ययुगीन कालखंडात सांगोला हे भरभराटीला आलेले शहर होते व त्याची
ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत
होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला करून ते
उद्ध्वस्त केले. त्यात शहराचे अतोनात नुकसान झाले व किल्ला पुर्णपणे
बेचिराख झाला. आज किल्ला प्रत्यक्षात अस्तित्वात नसुन केवळ वास्तूंच्या
आधारे किल्ल्याची स्थाननिश्चिती करावी लागते. जुन्या कागदपत्रातील
वर्णनानुसार सांगोला शहराभोवती असणारी तटबंदी म्हणजेच नगरकोट व शहराच्या
मध्यभागी असणाऱ्या छोट्याशा टेकडीवर असणारी तटबंदी म्हणजेच बालेकिल्ला अशी
याची रचना होती. वाढत जाणाऱ्या सांगोला शहरामुळे नगरकोट व त्याच्या
खाणाखुणा पुर्णपणे नामशेष झाल्या असुन मध्ययुगीन कालखंडाशी नाते सांगणारी
केवळ एक पायऱ्या, कमान व ओवरी असणारी बारव मोरया गल्लीत दिसुन येते तसेच
शिवाजी चौकासमोर असणाऱ्या मंडईत वेशीच्या दरवाजाशेजारी तटबंदीची भिंत काही
प्रमाणात दिसते. नगरकोटच्या इतक्याच खाणाखुणा असुन त्याही शोधाव्या लागतात.
त्यामानाने बालेकिल्ल्याचे अवशेष थोडेफार दिसुन येतात. शिवाजी चौकातून
समोरील उंचवट्यावर जाताना उजव्या बाजुला शेवटची घटका मोजत असणारा
किल्ल्याच्या तटबंदीतील एकमेव अवशेष असणारा सहा फुट उंचीचा ढासळलेला बुरूज
नजरेस पडतो. या बुरुजाच्या पुढे काही अंतरावर सहा फुट उंचीच्या चौथऱ्यावर
उभारलेली जुनी दगडी मस्जिद दिसुन येते. या चौथऱ्याखालील भागात दोन ओवऱ्या
असुन एक कोठारवजा खोली दिसुन येते. हा भाग मस्जिदच्या ताब्यात असल्याने आत
जाता येत नाही. या चौथऱ्यासमोरच चुना मळण्याचे दगडी चाक दिसुन येते पण घाणा
दिसत नाही. काळाच्या ओघात तो नष्ट झाला असावा. याच्या पुढील भागात
ब्रिटीशकालीन कोर्टाची इमारत असुन या इमारतीच्या मागील बाजुस किल्ल्याची
गडदेवता म्हणजेच क्षेत्रपाल म्हसोबाचे देऊळ आहे. देवळाकडून वाटेने सरळ
गेल्यावर उजव्या बाजुला बालेकिल्ल्यास पाणीपुरवठा करणारी पायऱ्यांची चौकोनी
बारव आहे. या बारवमध्ये उतरणाऱ्या पायऱ्यांच्या शेवटी एक कमान असलेला
दरवाजा आहे.
विहिरीच्या
खालील बाजुला उजवीकडे नरसिंहाचे छोटेसे घुमटीवजा लाल रंगात रंगविलेले
मंदिर आहे. बालेकिल्ल्याचे आजमितीस इतकेच अवशेष शिल्लक असुन नगरकोटचे व
बालेकिल्ल्याचे सर्व अवशेष पहाण्यास एक तास पुरेसा होतो. सांगोला किल्ला
आदिलशाही काळात (१४८९–१६८६) बांधला गेला असून गडावरील मशीद त्याच काळात
बांधली गेली आहे. तत्कालीन कागदपत्रानुसार सांगोला एक भरभराटीचे शहर असुन
त्याची ख्याती सोन्याचे सांगोला अशी होती. इ.स.१६८६ मध्ये आदिलशाही नष्ट
केल्यावर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात आला व १७०७मध्ये औरंगजेबाच्या
मृत्यूनंतर छत्रपती शाहूंमहाराज यांच्या अखत्यारीत हे शहर आले. छत्रपती
शाहूंनी केलेल्या सनदेनुसार राज्याचा कारभार पेशवे बाळाजी बाजीराव
यांच्याकडे आला. त्यानंतर १७५० मध्ये महाराणी ताराबाईंच्या यमाजी शिवदेव
नावाच्या सेवकाने सांगोल्याचा किल्ला हस्तगत करून बाळाजीं पेशवे
यांच्याविरूद्घ बंड पुकारले पण सदाशिवराव भाऊनी हे बंड उखडुन सांगोल्यावर
पुन्हा पेशव्यांची सत्ता स्थापन केली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकीर्दीत
(१७९५–१८१८) होळकरांच्या पठाण पलटणीने १८०२ मध्ये सांगोला शहरावर हल्ला
करून ते पुर्णपणे उद्ध्वस्त केले. पेशवाईच्या अस्तानंतर सांगोला इंग्रजी
अंमलाखाली आले व सांगोला येथे संपुर्ण महाराष्ट्रातील दुसरी नगरपालिका
स्थापन झाली.
© Suresh Nimbalkar
टेंभूर्णी
प्रकार : नगरकोट
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
टेभुर्णी
हे सोलापूरच्या माढा तालुक्यातील गाव मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून
ओळखले जाते. मराठा कालखंडात टेंभुर्णीचा मार्ग दळणवळणासाठी वापरला जात
असल्याने गावात आदिलशाही निजाम-मराठे यांच्या राजवटीचा इतिहास आजही वीरगळ,
सतीशिळा, नागदेवता शिल्पे व टेंभूर्णी कोट यांच्या अवशेष स्वरुपात पहायला
मिळतो. उत्तर पेशवेकाळात दुसरे बाजीराव पेशव्यांच्या वतीने टेंभुर्णीतील
सदाशिवराव माणकेश्वर यांनी निजामाबरोबरच्या शिष्टाईत त्यांचा प्रभाव
निजामावर पाडला. त्यामुळे निजामाने टेंभुर्णी हे गाव त्यांना इनाम म्हणून
दिले. भाऊंनी टेंभुर्णीमध्ये १८००च्या सुमारास एक राहता तीन मजली वाडा आणि
सैन्य- घोडे यांच्यासाठी एक वाडा असे दोन वाडे व संपूर्ण टेंभुर्णे
गावाभोवती तटबंदी बांधली. टेंभुर्णे गावाभोवती संरक्षणासाठी उभारलेली
तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक असुन काही ठिकाणी पडझड झाली आहे.
पुणे-सोलापूर महामार्गाने जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष
नजरेस पडतात. पूर्व-पश्चिम असलेला हा कोट चाळीस एकरात पसरलेला असुन बाहेरील
तटबंदीत एकुण सोळा बुरूज आहेत. तटबंदीच्या भिंतीची जाडी दहा फुटांपेक्षा
जास्त आहे. तटावर चढण्यासाठी आजही शिल्लक असलेल्या तटबंदीत दोन ठिकाणी जिने
पाहायला मिळतात. कोटाला प्रवेशासाठी दोन मोठे दरवाजे असुन चार लहान दिंडी
दरवाजे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे दिसणाऱ्या गडाच्या मुख्य
दरवाजातुन आत आल्यावर सर्वप्रथम उजवीकडे असणाऱ्या विद्यालयाच्या आवारात
दगडी बांधकामातील सुरेख गणेश मंदिर आहे तर डावीकडे महादेव मंदिर दिसते. हा
रस्ता कोटातून फिरत दुसऱ्या दरवाजातून बाहेर पडत असल्याने या वाटेने
गेल्यास सर्व अवशेष व्यवस्थीत पहायला मिळतात. या रस्त्याने पुढे आल्यावर
डाव्या बाजुस त्याकाळी गडातील वस्तीला पाणीपुरवठा करणारा बामनतळे तलाव
दिसतो. असाच एक तलाव गडाच्या बाहेर पश्चिम भागात असुन तो मांगतळे म्हणुन
ओळखला जातो. या वाटेने पुढे गेल्यावर दगडी तटबंदी व प्रशस्त आवार असणारे
घडीव दगडी बांधकामातील रामाचे मंदिर असून ते मोडकळीस आले आहे. राममंदिर
पाहुन पुढे आल्यावर उजव्या बाजुच्या गल्लीत सदाशिवराव माणकेश्वर यांचा वाडा
आहे. वाडा मोठया प्रमाणावर मोडकळीस आला असुन आजही तेथे काही लोकांचे
वास्तव्य आहे. ब्रिटिश राजवटीतील बाँबे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटमध्ये हा
वाडा बांधल्याची नोंद आहे. टेंभुर्णीत उभारलेल्या या वाड्यात पाणीपुरवठा
करण्यासाठी आमराईतून सायफन पद्धतीने पाणी आणले गेले होते. याचे उच्छवास
आजही वाड्याच्या समोर पहायला मिळतात. गावकऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे
वाड्याला तीन भुयारी मार्ग होते. एक मार्ग पूर्व वेशीत दुसरा मार्ग
नरसिंहपूरला तर तिसरा मार्ग आमराईत निघत होता. आमराईत निघणारे भुयार हे
भुयार नसुन पाणीपुरवठ्याचा उच्छवास आहे. वाडा पाहुन मुळ वाटेवर आल्यावर
थोडे पुढे उजव्या बाजुस प्रचंड प्रमाणात विखुरलेले दगड व ढासळलेले दगडमाती
बांधकामातील तीन बुरूज दिसतात. येथे सैनिकांसाठी व घोड्यांसाठी दुसरा वाडा
होता व या वाडयाला सहा बुरूज असल्याचे स्थानिक सांगतात. दुसऱ्या
वाड्याभोवती कोटाअंतर्गत सहा दगडी बुरुज असल्याने हा बहुदा सैन्य असलेला
बालेकिल्ला असावा. यातील उजव्या बाजुच्या बुरुजासमोर गावकऱ्यांनी एक चौथरा
बांधून त्यावर कोटात सापडलेली विरगळ, नागशिल्पे, नंदी व इतर दगडी शिल्पे
मांडुन ठेवली आहेत. डाव्या बाजुच्या बुरुजासमोर असलेल्या चबुतऱ्यावर सहा
मुस्लीम समाधी दिसून येतात. येथे समोरच गडाचा दुसरा मुख्य दरवाजा दिसून
येतो. कोटाचा हा दरवाजा इंदापूर वेस म्हणून ओळखला जातो. कोटाचा हा
पश्चिमेचा लाकडी दरवाजा व त्यावरील सज्जा आजही शिल्लक असुन त्यावर
जाण्यसाठी दोन्ही बाजुच्या बुरूजातून जिना आहे. या दरवाजाच्या आत असणाऱ्या
हनुमान मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार केला आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण
होते. गडाच्या या तटबंदीच्या बाहेरील बाजुस एक जुनी विहीर तसेच समोरील ओढा
पार करून डाव्या बाजुस एक प्राचीन बारव पहायला मिळते. संपुर्ण कोट फिरायला
एक तास पुरेसा होतो. मराठवाडा, सोलापूर, कर्नाटक यांकडील मोहिमांवर
जाण्यासाठी टेंभुर्णी मार्गाचा वापर केला गेला आहे. शिवरायांच्या
मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे लक्ष दक्षिणेकडे केंद्रित केले. इतिहासातील
नोंदीप्रमाणे औरंगजेबाचा पुत्र शहाजादा आज्जम मराठ्यांचा पाठलाग करत
टेंभुर्णी येथे २ ऑक्टोबर १६८२ रोजी मुक्कामाला थांबला होता. मराठे
त्यावेळी भीमा नदीच्या पलीकडे होते. भीमा नदीमुळे मराठे आणि मोगल यांच्या
प्रदेशाची विभागणी झाली होती. मराठे संधी मिळताच भीमा ओलांडून मोगलांवर
घसरत होते. मराठ्यांच्या फौजा भीमा नदीच्या परिसरात फिरत असल्याची बातमी
मिळताच मोगलांचा बक्षी बहरामंदखान १६९०मध्ये काटी परगण्यातून परांडा येथे
आला. त्याने त्याचे जड सामान परांड्यास ठेवले आणि तो टेंभुर्णी भागात धावून
गेला. गाजीउद्दीनखानही मराठ्यांच्या पाठलागावर तेथे आला होता. तेथे
दोघांची गाठ पडली. त्यानंतर बहरांमदखान परत परांड्यास आला. राजाराम महाराज
जिंजीतून स्वराज्यात आल्यावर१६९९ मध्ये त्यांनी स्वतः मोगलांविरुद्ध मोहीम
उघडली. राजाराम महाराजांच्या मोहिमेची माहिती मिळताच औरंगजेबने शहाजादा
आज्जमला महाराजांच्या पाठलागावर लावले. त्याने परांड्याजवळ महाराजांना
अडवल्यावर महाराजांनी टेंभुर्णीजवळ येऊन भीमानदी ओलांडून साताऱ्याकडे
प्रवास केला. उत्तर पेशवेकाळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव भाऊ
माणकेश्वर यांच्यामुळे टेंभुर्णी पुन्हा एकदा मराठ्यांच्या इतिहासात
प्रसिद्धीस आले. सदाशिवराव भाऊ माणकेश्वर सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात
पुण्यास आले व त्यांच्या अंगच्या गुणामुळे लवकरच सवाई माधवराव आणि नाना
फडणवीस यांच्या राजकीय प्रवाहात शिरले. सवाई माधवरावांच्या अकाली
मृत्यूनंतर बाजीराव दुसरे पेशवा बनले. सदाशिव माणकेश्वर यांनी दुसऱ्या
बाजीरावांचा पक्ष घेतला. बाजीरावांवरील निष्ठेमुळे सदाशिवराव भाऊ
बाजीरावाचे निकटवर्तीय बनले. बाजीराव पेशव्यांच्या चुकीच्या धोरणामुळे
यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करून शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा
पराभव केला व पेशवे वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले. पुढे वसईहून बाजीराव
पेशव्यांना इंग्रजांच्या मदतीने गादीवर बसवण्यात माणकेश्वरांनी मोलाची मदत
केली. त्यांना बाजीरावाने त्यांचा दिवाण म्हणून नेमले. १८१४-१५ पर्यंत
बाजीरावांची भाऊंवर मर्जी राहिली. पुढे सदाशिव माणकेश्वर बाजीरावांच्या
मर्जीतून उतरले. मराठी सत्तेच्या अखेरच्या कालखंडात टेंभुर्णीची व्यक्ती
मराठेशाहीची सूत्रे सांभाळत होती ही बाब टेंभुर्णीच्या इतिहासात भर घालणारी
आहे. मराठेशाहीच्या या कारभाऱ्याचा ८ ऑक्टोबर १८१७ रोजी पुण्यात मृत्यू
झाला. सदाशिव माणकेश्वरांच्या मृत्यूनंतर टेंभुर्णीचे ऐतिहासिक महत्त्व
ओसरले.
© Suresh Nimbalkar
मागे जा
टेंभुर्णीची गढी - टेंभूर्णीची गढीच्या अस्तित्वाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, ऐतिहासिक अवशेषांबद्दलची अनास्था या गढीच्या मुळावर उठल्याचे दिसून आले. सदाशिव माणकेश्वर नावाचा कुणी सरदार होता त्याने हि गढी बांधल्याचे सांगतात. गढी मध्ये माणकेश्वरांचा लाकडाचे कोरीव नक्षीकाम असणारा सातमजली वाडा होता आणि तो मालमत्ता वादातून जाळून टाकल्याचे इतिहासकार सांगतात. किल्ल्यात राम आणि विठ्ठलाचे मंदिर असून सध्या ते मोडकळीस आले आहे. रामभक्त हनुमान मंदिर मात्र तंदुरुस्त असल्याचे जाणवते.. किल्ल्यावर बामनतळे आणि मांगतळे.. गतकाळच्या दुर्दैवी जातीयतेची मूर्त उदाहरणे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे गढीचा मुख्य दरवाजा आणि आत डोकावल्यास डावीकडे बामनतळे नजरेस पडते. तसेच पुणे-सोलापूर महामार्गाकडे जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात.
टेंभुर्णीची गढी
टेंभुर्णी गावाला इतिहासही संपन्न आहे. ते मध्ययुगातील आदिलशाही, निजाम-मराठे यांच्या राजवटीतील अनेक घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे. पंढरपुरच्या आषाढी, कार्तिकी एकादशी वेळी टेंभुर्णीतून जाणाऱ्या हजारो दिंड्यांमुळे गावातील नागरिक विठ्ठलाच्या भक्तीत न्हाऊन निघतात. गावामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची मंदिरे, विठ्ठल मंदिर, राम मंदिर, भवानी मंदिर, मसादेवी मंदिर अशी प्रमुख मंदिरे आहेत. सर्व लोक ग्रामदेवतेची यात्रा, नवरात्र उत्सव यांसारख्या धार्मिक उत्सवांत मोठ्या उत्साहाने भाग घेतात. टेंभुर्णीमध्ये वीरगळ, सतीगळ, नागदेवतेची शिल्पे कोरलेले अवशेष पाहण्यास मिळतात.
टेंभुर्णीचा मार्ग मराठा कालखंडात दळणवळणासाठी सातत्याने वापरला गेला आहे. मराठवाडा, सोलापूर, कर्नाटक यांकडील मोहिमांवर जाण्यासाठी टेंभुर्णी मार्गाचा वापर केला गेला आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर, औरंगजेबाने त्याचे लक्ष दक्षिणेकडे केंद्रित केले. औरंगजेबाला तो मराठी सत्ता हां हां म्हणता जिंकून घेऊ शकेल असा फाजील आत्मविश्वास होता. पण त्या नादात त्याला पुढील सत्तावीस वर्षें दख्खन सोडता आले नाही. त्यातच मराठ्यांच्या शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास दडला आहे. मराठे त्यांच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी झगडले तर औरंगजेब साम्राज्यविस्तारासाठी. मराठ्यांची स्वातंत्र्ययुद्धात सरशी झाली. मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान टेंभुर्णीचा संदर्भ अनेक वेळेस येतो. इतिहासातील नोंद सांगते, की शहाजादा आज्जम हा औरंगजेबाचा पुत्र मराठ्यांचा पाठलाग करत असता टेंभुर्णी येथे 2 ऑक्टोबर 1682 रोजी मुक्कामाला थांबला होता.
मराठे
त्यावेळी भीमा नदीच्या पलीकडे होते. गनिमी युद्धतंत्राच्या प्रभावी
वापरामुळे मराठ्यांनी मोगलांना बेहाल केले होते. मराठे आले म्हणून एखाद्या
भागात बंदोबस्त लावावा, तर मराठे दुसरीकडेच प्रकट होत! कोठे फौज पाठवावी
याचे मोगलांना कोडे पडले होते. मराठ्यांच्या अशा चकवेगिरीमुळे मोगलांची फौज
मोठ्या प्रमाणात विभागली गेली होती. भीमा नदीमुळे मराठे आणि मोगल यांच्या
प्रदेशाची विभागणी झाली होती. मराठे संधी मिळताच भीमा ओलांडून मोगलांवर
घसरत होते. मराठ्यांच्या रात्री-अपरात्रीच्या छाप्यांपासून बचाव व्हावा
यासाठी मोगलांना खबरदारी घ्यावी लागत असे. एकदा, मराठ्यांच्या फौजा भीमा
नदीच्या परिसरात फिरत असल्याची बातमी मिळताच मोगलांचा बक्षी बहरामंदखान
(1690) काटी परगण्यातून परांडा येथे आला. त्याने त्याचे जड सामान परांड्यास
ठेवले आणि तो टेंभुर्णी भागात धावून गेला. गाजीउद्दीनखानही (निजाम उल
मुल्कचा बाप) मराठ्यांच्या पाठलागावर तेथे आला होता. तेथे दोघांची गाठ
पडली. त्यानंतर बहरांमदखान परत परांड्यास आला. मराठ्यांच्या प्रभावी, चपळ
युद्धतंत्रापुढे मोगलांची मात्रा चालत नव्हती. त्यामुळे काही मातब्बर
सरदारांनाही तोंडावर पडण्याची वेळ आली.राजाराम महाराजांनी जिंजीतून सुखरूपपणे स्वराज्यात आल्यानंतर, 1699 मध्ये मोगलांविरुद्ध मोहीम उघडली. त्यांनी स्वत: वऱ्हाड, खानदेश भागांत मोहीम आखली होती. राजाराम महाराज साताऱ्याहून बाहेरही पडले होते. महाराजांनी स्वत:सोबत सात हजार स्वार; शिवाय धनाजी जाधव, रामचंद्र अमात्य, दादो मल्हार हे मातब्बर सरदार घेतले होते. राजाराम महाराजांच्या मोहिमेची माहिती मिळताच बादशहाने शहाजादा आज्जमच्या मुलाला महाराजांच्या पाठलागावर लावले. त्याने परांड्याजवळ महाराजांना अडवल्यावर महाराजांनी टेंभुर्णीजवळ येऊन भीमानदी ओलांडून साताऱ्याकडे प्रवास केला. महाराजांची योजना बादशहाला कळल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.
उत्तर पेशवेकाळात टेंभुर्णीतील कीर्तनकार सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांच्या कर्तृत्वामुळे टेंभुर्णी पुन्हा एकदा मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीच्या झोतात आली. भाऊ कीर्तनकार असले तरी तत्कालीन राजकारणाची पुरती जाण असणारे आणि संधीचे सोने करून घेणारे मुत्सदी म्हणून ओळखले गेले. सदाशिवराव भाऊ माणकेश्वर हे सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यात येऊन ठेपले, ते त्यांच्या अंगी कीर्तनाचे गुण असल्यामुळे. ते पुण्यात लवकरच सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांच्या राजकीय प्रवाहात शिरले. सवाई माधवरावांच्या अकाली मृत्यूनंतर मराठेशाहीतील अस्थिर, अनागोंदीच्या राजकीय पार्श्वभूमीवर बाजीराव दुसरे पेशवा बनले. सदाशिव माणकेश्वर हेही दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कळपात गेले. सत्ताबदलानंतर, भाऊंनी घेतलेला निर्णय योग्य ठरला. त्यांना बाजीरावांवरील निष्ठेमुळे मानाची पदे मिळत गेली. सदाशिवराव भाऊ बाजीरावाचे निकटवर्तीय बनल्याने पेशव्यांनी त्यांना राहण्यासाठी दादा कद्रे यांचा वैभवशाली वाडा दिला. पुढे, सदाशिवराव भाऊंनी स्वत:चा उत्तम वाडा पुण्यातच नाना वाड्याजवळ बांधला. त्याच काळात त्यांच्या हाती प्रत्यक्ष कारभारी म्हणून पेशव्यांचे शिक्के कटारीच आल्या. सदाशिव माणकेश्वर यांना अंबारीचे हत्ती, इजायतीची वस्त्रे 20 मार्च 1801 रोजी झाली. भाऊंनी बाजीरावाने त्यांचा कारभारी म्हणून त्यांची नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत मोठे अर्थार्जनही केले. पुढे, 1814-15 पर्यंत बाजीरावांची भाऊंवर मर्जी राहिली.
बाजीरावांनी सत्तेवर येताच हैदराबादच्या निजामाबरोबर काही नाजूक कामासाठी सदाशिवरावभाऊंना पाठवले; सोबतीला घोडदळ, पायदळ असा मोठा सरंजाम दिला. निजामाबरोबरच्या शिष्टाईत, सदाशिवरावभाऊंनी त्यांचा प्रभाव निजामावर पाडला. त्यामुळे निजामाने टेंभुर्णी हे गाव त्यांना कायमचे इनाम म्हणून दिले. भाऊंनी त्यांच्या अंगच्या हुशारीमुळे त्यांची प्रगती करून घेतली होती. भाऊंच्या प्रगतीसोबत टेंभुर्णीही प्रकाशझोतात राहिली.
बाजीराव
पेशव्यांच्या चुकीच्या धोरणामुळे यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला करून
शिंदे व पेशवे यांच्या फौजांचा धुव्वा उडवून पेशव्यांना पुण्यातून पळवून
लावले होते. पेशवे वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेले होते. पुढे, वसईहून
बाजीराव पेशव्यांना इंग्रजांच्या मदतीने गादीवर बसवण्यात माणकेश्वरांनी
मोलाची मदत केली. त्यांना बाजीरावाने त्यांचा दिवाण म्हणून नेमले. त्यामुळे
हत्ती, घोडे, पालखी, चौघडा, सोन्याच्या दांडीची चवरी, सोन्याच्या काठ्या,
चोपदारी, पुरी ताजीम, समोर येण असे अनेक बहुमान व मानपान त्यांना मिळाले.
पुढे, कित्येक वर्षें भाऊ, बयाजी नाईक व खरशेटजी मोदी यांनी बाजीराव व
इंग्रज रेसिडेंट यांच्यामधील मध्यस्थ म्हणून कामकाज पाहिले होते. भाऊ आणि
मोदी यांचे सूत जमल्याने दोघांनी एकविचारे राहून लाखो रुपये कमावले. पुढे
एल्फिन्स्टनच्या कारकिर्दीत खुद्द एल्फिन्स्टनला देशी भाषा येत असल्याने
भाऊंचे मध्यस्थी करण्याचे महत्त्व संपुष्टात आले. त्याच वेळी त्रिंबकजी
डेंगळे व मोदी यांचे सूत जमल्याने सदाशिवभाऊ माणकेश्वर बाजीरावांच्या
मर्जीतून उतरले. मराठी सत्तेच्या अखेरच्या कालखंडात टेंभुर्णीची प्रभावशाली
व्यक्ती मराठेशाहीची सूत्रे सांभाळत होती ही महत्त्वाची बाब टेंभुर्णीच्या
इतिहासात भर घालणारी आहे. मराठेशाहीच्या कारभाऱ्याचा 8 ऑक्टोबर 1817 रोजी
पुण्यातच मृत्यू झाला. माणकेश्वरांच्या मृत्यूनंतर टेंभुर्णीचे ऐतिहासिक
महत्त्व ओसरल्याचे दिसते.भाऊंनी टेंभुर्णीमध्ये दोन वाडे बांधले. तीन मजली वाडा सन 1800 च्या सुमारास बांधला. एक राहता वाडा आणि सैन्य, घोडे यांना राहण्या-उतरण्यासाठी आणखी एक वाडा बांधला. त्याला हवेली असे म्हणत. त्याच्या भोवती सहा दगडी बुरुज होते. ब्रिटिश राजवटीतील बाँबे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटमध्ये वाडा बांधल्याची नोंद आहे. ती अशी - 'The growth of Tembhurni dates from its grant in inam to Sadashiv Mankeshwar who built a fort now much out of repair.' टेंभुर्णीत उभारला गेलेला वाडा हा शनिवारवाड्याप्रमाणे सोयींनी परिपूर्ण होता. वाड्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आमराईतून सायफन पद्धतीने पाणी आणले गेले होते. वाड्याला तीन भुयारी मार्ग होते. एक मार्ग पूर्व वेशीत, दुसरा मार्ग नरसिंहपूरला तर तिसरा मार्ग आमराईत निघत होता. हवेलीच्या बुरुजाचे अवशेष दिसतात. वाड्याचीही पडझड झाली आहे. संपूर्ण टेंभुर्णेभोवती संरक्षणासाठी तटबंदी उभारली गेली होती. पूर्व-पश्चिम दोन्ही दिशांना भव्य वेशी होत्या. पश्चिम वेस इंदापूर वेस म्हणून ओळखली जाते. शिवाय, तटबंदीला सोळा बुरुज, चार खिंडी आहेत. तटबंदीच्या भिंतीची जाडी सुमारे दहा फुटांपेक्षा जास्त आहे. टेंभुर्णीमध्ये तिचे अस्तित्व दिसते, परंतु तेथे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
टेंभूर्णीची गढीच्या अस्तित्वाची लढाई शेवटच्या टप्प्यात आली आहे, ऐतिहासिक अवशेषांबद्दलची अनास्था या गढीच्या मुळावर उठल्याचे दिसून आले. सदाशिव माणकेश्वर नावाचा कुणी सरदार होता त्याने हि गढी बांधल्याचे सांगतात. गढी मध्ये माणकेश्वरांचा लाकडाचे कोरीव नक्षीकाम असणारा सातमजली वाडा होता आणि तो मालमत्ता वादातून जाळून टाकल्याचे इतिहासकार सांगतात. किल्ल्यात राम आणि विठ्ठलाचे मंदिर असून सध्या ते मोडकळीस आले आहे. रामभक्त हनुमान मंदिर मात्र तंदुरुस्त असल्याचे जाणवते.. किल्ल्यावर बामनतळे आणि मांगतळे.. गतकाळच्या दुर्दैवी जातीयतेची मूर्त उदाहरणे आहेत. अकलूज-टेंभूर्णी रस्त्यावर उजवीकडे गढीचा मुख्य दरवाजा आणि आत डोकावल्यास डावीकडे बामनतळे नजरेस पडते. तसेच पुणे-सोलापूर महामार्गाकडे जाताना उजवीकडे काही बुरुज आणि तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात.
https://thinkmaharashtra.com/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87/
ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते
नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरची शेजारची मोठी गावे आहेत. नातेपुते हे पुणे-पंढरपूर या किंवा जुन्या महाड-पंढरपूर या रस्त्यावर आहे. तसेच ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शिखर शिंगणापूर या महादेवाच्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. ते सातारा जिल्ह्यात 1930 पर्यंत होते. त्यापुढे पूर्वीचा माणदेशी परिसर. बोलीभाषा, संस्कृती, चालीरीती, परंपरा तशाच. गाव पर्जन्यछायेच्या प्रदेशात. वार्षिक सरासरी पाऊसमान चारशे ते पाचशे मिलिमीटर. परंतु सध्या नीरा उजव्या कालव्यामुळे पाण्याची परिस्थिती चांगली आहे.
नातेपुते गावाचा इतिहास इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत पाहता येतो. नातेपुते गावाचे ग्रामदैवत गौरीहर मंदिराच्या बांधकामावरून ते ध्यानी येते. देऊळ बहामनी काळात (1350) हेमाडपंती शैलीत बांधले गेले आहे. गावाबाहेरील तळ्याचा नातेपुते गावाच्या पाणीपुरवठा योजनेत साठवण तलाव म्हणून वापर होतो. त्यास फुटके तळे असे म्हणतात. तलावाच्या बांधकामावरील चिन्हावरून तो इतिहास देवगिरीच्या यादव राजांपर्यंत पोचतो. गावाभोवती भक्कम भुईकोट किल्लेवजा तटबंदी होती. तिचे थोडे अवशेष भग्नावस्थेत दिसतात. औंध, फलटण, सातारा, पुणे, नगर, विजापूर इत्यादी ऐतिहासिक संस्थांनांचा कारभार शेजारी होता. तटबंदीच्या आतमध्ये त्याकाळी शंभर-दीडशे कुटुंबे असावीत. ग्रामदैवत गिरिजापती (गौरीहर) मंदिर म्हणून त्यात वतनदार, मंदिराचे पुजारी बडवे, घडशी समाजातील भोसले, कलावंत-शेख कुटुंबे, प्रामुख्याने पाच-दहा कुटुंबे वाणी-जंगमांची होती व शेतकरी कुणबी अशी छोटी लोकवस्ती होती.
नातेपुते गावास इतिहासकाळात ‘शंकरापठण’ असे नाव होते. जुन्या महाराष्ट्रातील मराठ्यांचे (हैदराबाद संस्थानचा मराठवाडा) कुलदैवत असल्याने त्या भागातील अनेकांनी देवळाच्या बांधणीस हातभार लावला आहे. त्यांची नावे पायऱ्यावर, खांबांवर, फरशीवर, दरवाज्यांच्या उंबरठ्यावर वगैरे ठिकठिकाणी खोदलेली आढळतात. गिरिजाशंकर मंदिरासमोर चांगला विस्तीर्ण व उत्तम दगडी बांधणीचा तलाव आहे. पूर्वी उन्हाळ्यात त्या ठिकाणी मोठी यात्रा भरत असे. शाहू महाराजांचे आध्यात्मिक गुरू, ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी तो तलाव यात्रेकरूंच्या सोयीसाठी बांधला आहे. तलावाच्या बांधकामासाठी दहा हजार रुपये खर्च झाला आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी भिक्षाद्रव्य गोळा करून लोकोपयोगी देवालये, तलाव, विहिरी बांधल्या आहेत. त्यांना छत्रपती, पेशवे व काही मराठे सरदार यांच्याकडून पंधरा हजार आठशेतेहतीस रुपयांचे भिक्षाद्रव्य मिळत असे.
औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याचा पुत्र शहाजादा आंजुमशहा याने शिखर शिंगणापूर येथील ते देऊळ त्याच्या परवानगीने पाडून टाकले. देवाची यात्रा त्या वेळेपासून ‘शंकरापठण’ ऊर्फ नातेपुते येथे बादशहाच्या अंमलात भरत होती. शाहू छत्रपतींच्या काळात बसंतराव त्यांचा विश्वासू खोजा होता. त्याने त्या देवळाचा जीर्णोद्धार केला. त्यावेळी स्वामी शाहू महाराजांची परवानगी घेऊन पूर्वीचे हेमाडपंती यादवकालीन देवालय होते ते नवीन बांधले. त्याने श्री शंभू महादेव यांचे देवालय बांधून त्याचे नाव श्री सन्मुख उंबर्यालगत घातले आहे. त्यावर चरणी तत्पर बसंतराव निरंतर अशी अक्षरे कासवालगत काढली आहेत. लाखो यात्रेकरूंचे पाय त्या नावावर लागतात, त्यामुळे ते एक पुण्यप्रद काम ठरते.
बसंतराव खोजा याने शिखर शिंगणापूरच्या देवळाचा जीर्णोद्धार पूर्ण झाल्यावर नातेपुते येथे भरणारी देवाची यात्रा मना केली. त्याने शिखराखाली यात्रा पुन्हा भरण्यासाठी सरकारच्या शिक्क्यासह कौल दिला. बसंतराव खोजा याचे आडनाव कासुर्डे असून तो जातीने वाणी होता.
गंगाधरशास्त्री यांचा खून पंढरपूर क्षेत्रामध्ये 1815 मध्ये झाला. त्रिंबकजी डेंगळे हा दुसर्या बाजीरावाचा कारभारी. त्यानेच तो खून केल्याचे सांगून बाजीराव पेशव्यांमार्फत त्याला अटक करण्यास भाग पाडले. त्याला 1815च्या ऑक्टोबरमध्ये ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. इंग्रजांनी तुरुंगातील बंदोबस्तासाठी दक्षता घेऊनही त्रिंबकजी 12 सप्टेंबर 1816 रोजी फरार झाला. त्याने तुरुंगातून तबेल्याच्या भिंतीस भोक पाडले. त्याने त्यासाठी घोड्याची निगा राखणारा इसम हाती धरला. तो बाजीरावाने पाठवला होता. तो घोड्याच्या तबेल्यात राहून निगा राखता राखता गाणी गायचा. त्या गाण्याचा अर्थ इंग्रज शिपायांना कळत नसे, पण त्रिंबकजीला समजत असे. त्रिंबकजी त्याचा फायदा घेऊन निसटला. तो प्रथम खानदेशात गेला. नंतर सातार्याजवळ महादेवाच्या डोंगरात राहू लागला. त्याने त्यावेळी नातेपुते भागातील लोकांतून मदतीसाठी बारा विश्वासू सहकारी तयार केले. त्याने ब्रिटिशांविरूद्ध बंडाळी पुन्हा चालू केली. ब्रिटिशांनी त्रिंबकजीला पकडून देणार्याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले. तसेच, त्रिंबकजीचा नुसता ठावठिकाणा, पत्ता लावून देणार्यास इंग्रजांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस व एक चाहूर जमीन देण्याचे जाहीर केले.
त्रिंबकजींचा पत्ता ठाऊक असून जर कोणी त्याची माहिती इंग्रजांना दिली नाही तर त्याचे पारिपत्य केले जाईल असा जाहीरनामा पेशव्याने जरी काढून त्यावेळच्या पंढरपूरच्या कमाविसदार बाबुराव गणेश याला कळवला तरी प्रत्यक्ष बाजीराव पेशवाच त्रिंबकजीला सहाय्य करत होता. त्रिंबकजी डेंगळे याने जमवलेले विश्वासू बारा साक्षीदार नावानिशी पुढीलप्रमाणे : 1. बापू गायकवाड शेटफळकर, 2. नागोजी वाळुंज, 3. रविराव शिंदे लोणीकर, 4. महादजी पंत नातेपोतेकर, 5. तिमाप्पा वडारी, 6. गोधाजी डेंगळा, 7. सयाजी मुळे, 8. आप्पाजी पाकुरवावीकर,9. निंबाजी जाधव फलटणकर, 10. महिपतराव डेंगळा, 11. बापू वरडकर, 12. दाजी डफळे.
बाजीराव पेशव्याने नातेपुते महालाचा महालकरी त्रिंबकजीला मदत व्हावी असाच कारकून नेमला.
त्यावेळी घटना ज्या घडत होत्या त्याचे नातेपुते हे काही काळ केंद्रच बनले. संताजी घोरपडे, सेनापती याची हत्या 1697 च्या आषाढ महिन्यात नागोजी माने म्हसवडकर याने केली. बादशहाचा तळ त्यावेळी ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) येथे होता. त्याने बादशहाकडे अर्ज करून ज्या मागण्या केल्या आहेत त्यात नात्यापोत्याची गढी त्याला मिळावी; तसेच, ती गढी आतील साहित्य, शस्त्र, दारुगोळा यांसह मिळावी असा अर्ज औरंगजेब बादशहाकडे केला. त्यावरून त्या ठिकाणची गढी लष्करी दृष्ट्या महत्त्वाची होती हे लक्षात येते. गढीचे काही अवशेष नातेपुते गावी दिसून येतात. त्रिंबकजी साष्टीच्या तुरुंगातून पळाला, त्याने वरघाटी येऊन-डोंगरात राहून जमाव सुरू केला.
नातेपुते गावाची लोकसंख्या 1875 साली दोन हजार तीनशे शहात्तर, 1881 साली दोन हजार दोनशेएकसष्ट, 1971 साली सात हजार नउशेबेचाळीस, 2001 साली सोळा हजार सात व 2011 साली सतरा हजार नउशेएकोणसाठ अशी वाढत गेलेली आहे. गावात अठरापगड जातिधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.
लोकांचा मुख्य व्यवसाय शेती, व्यापार व घोंगडी तयार करणे असा होता. शेतमालाची मोठी बाजारपेठ म्हणून पूर्वीपासून नातेपुते प्रसिद्ध आहे. (सोलापूर जिल्हा गॅझेट, 1884). नातेपुते गावच्या परिसरातील चाळीस-पन्नास खेड्यांचा व्यापारउदीम, देवाणघेवाण नातेपुते बाजारपेठेत होतो. शेतमालाबरोबरच कापड, किराणा व भुसार माल, सोने-चांदी व फर्निचर या क्षेत्रांत तेथील व्यापार्यांनी मोठी भरारी घेतलेली आहे व फार मोठी आर्थिक उलाढाल त्या क्षेत्रात होते. नातेपुते गावचा आठवडी बाजार दर बुधवारी असतो. तो मोठा व पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असते. माल व प्रवासी वाहतूक यासाठी खाजगी सर्व प्रकारच्या गाड्या तेथे उपलब्ध आहेत. शेतीही आधुनिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे गावचे लोक कष्टाळू, उद्योगी व स्वयंभू; तसेच, समाधानी व सुखी आहेत.
गावात कापसाच्या आठ जिनिंग फॅक्टरी 1960 ते 1980 च्या काळात दिवसरात्र चालत होत्या. त्यामुळे रोजगार भरपूर होता. त्याकाळी नातेपुते ही मोठी बाजारपेठ शेंग-गूळ-कापसाची होती.
सद्यस्थितीत बराचसा नोकरवर्गही गावात स्थायिक झालेला आहे. स्वतंत्र आधुनिक बंगले व कॉलनी यांमुळे गावचे रूप पालटून गेलेले आहे. नातेपुते गाव पुणे-पंढरपूर रस्त्यावर असल्याने व शेजारी परिसरात वाडीवस्त्या व खेडी यांची संख्या जवळजवळ पंचवीस-तीस असल्याने रोज मोठे दळणवळण होत असते. तेथून सुमारे दीडशेभर एस.टी. बसगाड्यांची रोज ये-जा होत असते. त्याचा परिणाम म्हणून नातेपुते गावचे शहरीकरण-नागरीकरण वेगाने होत आहे व त्यामुळे तेथील जमिनींचे बाजारभाव खूप चढे आहेत.
नातेपुते गावाला पूर्वी ऐतिहासिक साखरबावी विहीर व पांडुरंगाच्या मंदिराशेजारचा आड यांचे पाणी पिण्यासाठी वापरात होते. पाऊसपाणी नियमित असल्यामुळे गावचा ओढा बारा महिने वाहत असे. त्यामुळे दुष्काळातही पाणी कमी पडत नसे. गावाला सॅण्ड फिल्टरेशनची चांगली पाणीपुरवठा योजना ग्राम पंचायतीच्या माध्यमातून 1970 च्या आसपास सुरू झाली. तिचे विस्तारीकरण होत आहे. तसेच नातेपुतेच्या इशान्य बाजूने ब्रिटिशांनी बांधलेला नीरा उजवा कालवा गेला आहे. त्यापुढे भोर तालुक्यात असलेल्या नीरा-भाटघर-देवधर-गुंजवणी या धरणांमुळे पंढरपूरपर्यंतचा भाग सुजलाम् सुफलाम् झालेला आहे. नातेपुते गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या जुन्या तळ्यात नीरा उजव्या कॅनॉलचे पाणी साठवले जाते. ते टाक्यांमधून फिल्टरेशन व निर्जंतुकीकरण करून गावाला नळावाटे दिले जाते. ग्राम पंचायतीला नागरिकांना सुमारे आठ लाख लिटर पाणी दिवसाला पुरवावे लागते. गाव पाण्याबाबत पूर्वीपासून सुखी व समाधानी आहे. नातेपुते गावाची पाणीपुरवठा योजना राज्यात आदर्श अशी मानले जाते.
नातेपुते ग्रामपंचायतीची स्थापना 1933 साली झाली. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ’ ही संस्था पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. कालांतराने आणखी तीन खाजगी सहकारी शेतकरी सोसायट्या निर्माण झाल्या. सध्या पाच राष्ट्रीकृत बँका, सहा नागरी सहकारी बँका व अकरा सहकारी पतसंस्था, साठ महिला बचत गट व अनेक खाजगी फायनान्स कंपन्या गावात कार्यरत आहेत. मार्केट कमिटीत मोठा व्यापार होतो.
नातेपुते गावात सरकारी अद्ययावत ग्रामीण रुग्णालय, चोवीस खासगी दवाखाने व तज्ज्ञ सात डॉक्टर आहेत. गावात बालवाडी ते कॉलेज व व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बालवाडी ते बारावीपर्यंतच्या तीन खाजगी संस्था, एक महाविद्यालय, एक आय.टी.आय. तर पंचवीस सरकारी अंगणवाड्या सुरू आहेत. त्यांचा लाभ परिसरातील वीस-पंचवीस खेड्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांना होतो. ग्रामपंचायत सार्वजनिक वाचनालय मोठे व चांगले आहे. त्यात सुमारे पंधरा हजार ग्रंथ आहेत.
गावात सुंदर व प्रशस्त ग्राम पंचायत कार्यालय, तलाठी व सर्कल कार्यालय, सिटी सर्व्हे कार्यालय, वीज उपकेंद्र कार्यालय, सार्वजनिक बांधकाम व इरिगेशन कार्यालय व कॉलनी, टपाल व दूरध्वनी कार्यालय, स्वतंत्र पोलिस ठाणे, एस.टी. स्टॅण्ड अशी अनेक सरकारी कार्यालये व तेथील कर्मचाऱ्याच्या वस्त्या निर्माण झाल्या आहेत.
ग्रामदैवत गिरिजापतीस गौरीहर असेही म्हटले जाते. नातेपुते हे पार्वतीचे माहेर मानले गेले आहे. नातेपुते हे गाव शिखर-शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेले असल्याने परिसरात असलेल्या सर्व हेमाडपंती अष्टलिंग मंदिरांपैकी नातेपुतेचे गिरिजापती मंदिर एक आहे. शिवभक्त बळीराजा हा तिचा भाऊ. त्याचेही सुंदर मंदिर गिरिजापती मंदिराशेजारी आहे. नातेपुते गावच्या मध्यभागी सुंदर असे ऐतिहासिक शिवाचे मंदिर आहे. मंदिर हेमाडपंती भक्कम दगडाच्या तटबंदीसह उंचावर बांधलेले आहे. मंदिर बहामनी काळातील (1350) आहे.
तसेच नातेपुते गावाच्या दक्षिणेला छोट्या टेकडीवर निसर्गरम्य सुंदर असे श्री पर्वतेश्वराचे दुसरे शिवमंदिर आहे. ते रचनेवरून पेशवेकालीन वाटते. मध्ये गावाचा ओढा आहे. मंदिराला जाण्यासाठी गावातून पूर्वेला व पश्चिमेला ओढ्यातून दोन पाणंद रस्ते आहेत. पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा मोठी झाडे असल्याने भाविकांच्या मनाला तो प्रवास आल्हाददायी व आनंदी वाटतो. तेथे राष्ट्रीय पक्षी मोरांचा वावर खूप आहे. गावाच्या ओढ्याची पूर्व बाजू तर ‘मोरांचा ओढा’ म्हणून प्रसिद्ध आहे. ग्राम पंचायतीने उत्तम अशी स्मशानभूमी पर्वतेश्वराशेजारी सर्व जाती-धर्मांसाठी तयार केलेली आहे.
ग्रामदैवत गौरीहराचे मंदिर हे मराठवाड्यातील लोकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान आहे. तेथे चैत्र शुद्ध पंचमी ते अष्टमी या काळात मोठा उत्सव असतो. अनेक मानाच्या काठ्या व कावडी वाजतगाजत पायी देवाला पाण्याने अभिषेक घालण्यासाठी येतात. पंचमीला देवाला हळदी लागतात व अष्टमीला मध्यरात्री देवाचा विवाह सोहळा पार पडतो. या शिव-पार्वती विवाहासाठी मराठवाड्यातील भातंगडी गावाच्या ‘भातंगडी काठी’चा मान मोठा आहे. भातंगडी काठी म्हणजे पाण्याची कावड देवाला वाहिली जाते. पुढे ती काठी शिखर शिंगणापूरी जाते. पाण्याच्या अशा अनेक कावडी चैत्र यात्रेवेळी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पायीपायी, वाजतगाजत येतात. विवाह समारंभ मंदिरात रात्री होतो. देवळासमोरील उंच दीपमाळा पेटवल्या जातात. दीपमाळा शिखर शिंगणापूरच्या उंच डोंगरावरील देवळावरून दिसतात. तो लग्नसोहळा गावातील मानकरी, वतनदार, बडवे, भोसले, कलावंत-शेख, पाटील, देशमुख, देशपांडे, सर्व गावकरी आनंदाने मिळून पार पाडतात. लग्नातील नवरदेवाचा मान धनगर समाजातील माळशिरसच्या वाघमोडे पाटलांकडे तर नवरीचा मान नातेपुत्याच्या पांढरे-पाटील घराण्याकडे आहे.गावकरी दैनंदिन जीवनात परंपरेने चैत्र महिन्यात अनेक गोष्टी व्रताप्रमाणे पाळतात. श्री शंकर-पार्वतीचे लग्न प्रतीकात्मकच असते.
नातेपुते गावातील गिरिजापती मंदिर, बळीराजाचे मंदिर, समोरील तळे व संपूर्ण परिसर हा सातार्याचे राजे भोसले कुटुंबीयांच्या खाजगी मालकीचा आहे. सातार्याच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संस्थानाकडून लिलाव पद्धतीने दरवर्षी दैनंदिन पूजाअर्चा व व्यवस्थेचे नियोजन केले जाते. बडवे कुटुंबीय पिढ्यान्पिढ्या ते सर्व श्रद्धेने व निष्ठेने करतात. देवाच्या पूजाअर्चा व व्यवस्था यांसाठी सातारा संस्थानातर्फे पुजारी बडवे, घडशी समाजाचे भोसले व कलावंत-शेख यांच्या कुटुंबीयांना उपजीविकेसाठी वतने म्हणून जमिनी दिलेल्या आहेत व देवस्थानाची व्यवस्था लावून दिलेली आहे.
नातेपुते गावाला ठरावीक अशी यात्रा-जत्रा परंपरा नाही. परंतु नातेपुते हे गाव आळंदी-पुणे-पंढरपूर मार्गावर असल्याने पूर्वीपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत सोपान महाराज; तसेच, अनेक थोर साधुसंतांचा पालखी सोहळा पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी दरवर्षी जून-जुलै महिन्यात तेथूनच पायी जात-येत असतो. तो सोहळा मोठा व नयनरम्य असतो. नातेपुते या ठिकाणी पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. पालखी सोहळा हा नातेपुते गावाच्या लोकांचा सर्वात मोठा अभिमानाचा, आनंदाचा, श्रद्धेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. चार ते पाच लाख वारकर्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था सर्व जाती-धर्मातील गावकरी आनंदाने व कर्तव्यभावनेने करतात; सामाजिक ऐक्य व एकोपा यांचे दर्शन घडवतात. भजन, कीर्तन, प्रवचन व नामस्मरण अशा धार्मिक वातावरणात सारा गाव, आसमंत काही काळ डुंबून जातो.
नातेपुते गावाच्या दक्षिणेला, ओढ्याच्या पलीकडे साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर छोट्या टेकडीवर श्रीपर्वतेश्वर हे निसर्गरम्य शिवालय आहे. मंदिर बांधकामाचा ऐतिहासिक कालावधी निश्चित सापडत नाही. परंतु मूळ गाभार्याचे बांधकाम, तटबंदी प्राचीन असून सभामंडपाचे बांधकाम मात्र शंभर वर्षांपूर्वीचे असावे. मंदिराच्या थोडेसे दक्षिणेला ज्योतिबा तर आग्नेयेला सिद्धनाथ ही दोन छोटी मंदिरे आहेत. गावकरी श्रावणातील नागपंचमी उत्सव/सण दरवर्षी पर्वतेश्वराच्या मंदिराजवळ साजरा करतात. अलिकडे त्यास गावजत्रेचे स्वरूप आलेले आहे. त्या दिवशी त्या ठिकाणी नागोबा देवतेची प्रतीकात्मक पूजा नाभिक समाजातील राऊत कुटुंबीय करतात. गावकरी त्याचे दर्शन घेतात. त्यानिमित्ताने मंदिरातील परिसरात महिलांचे पारंपरिक खेळ, युवक व बालकांचे पतंगोत्सव, मैदानी खेळ; तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. सर्व प्रकारची खेळणी, मेवामिठाई यांचा आस्वाद गावकरी निसर्गसान्निध्यात घेतात.
श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी ग्रामदैवत गौरीहराच्या मंदिरात गावकऱ्याच्या वतीने महाप्रसाद भंडार्याचे (अन्नदान) व सायंकाळी महादेव आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन ग्राम पंचायत व नातेपुतेकर ग्रामस्थ यांच्या मार्फत केले जाते.
नातेपुते गावात मुस्लिम समाज बराच आहे. शेख, तांबोळी, मुस्लिम, आतार, बागवान, नदाफ (पिंजारी) अशी पारंपरिक व्यावसायिक मंडळी आहेत. मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ ऐतिहासिक शाही मशीद मोगलकालीन आहे. त्याचे इमाम व मानकरी काझी व मुलाणी हे आहेत. गावाबाहेर जुने दर्गे व पीर आहेत. मुस्लिम समाजाचे धार्मिक उत्सव व कार्यक्रम त्या ठिकाणी केले जातात.
जैन धर्मीयांनी चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर मुख्य पेठेत 1921 साली बांधले. त्या ठिकाणी 1008 भगवान श्री आदिनाथ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिराचा जीर्णोद्धारही अलिकडील काळात करण्यात आला. जैन समाज गुजरात-राजस्थान या भागातून उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात दोन-तीनशे वर्षांपूर्वी आला. तो समाज व्यापार-उद्योगधंद्यात स्थिर व यशस्वी आहे. नातेपुते गावास व्यापारी पेठ म्हणून जो लौकिक प्राप्त आहे त्यात त्या समाजाचा वाटा मोठा आहे.
गावातील सधन व प्रतिष्ठित शंकरराव घुगरदरे, रघुनाथराव घुगरदरे, रघुनाथ इंगोले, मोहिनीराज ख्रिस्ती व गावकरी यांनी मिळून श्रीराम मंदिराची उभारणी व मूर्ती प्रतिष्ठापना शके 1848 मध्ये केलेली आहे. गावातील व्यापारी खंडो रामजी सोनवळ यांनी रामपंचायतनाच्या सुंदर व संगमरवरी मूर्ती दान म्हणून दिल्या. पूर्वीचे राम मंदिर गिरिजापती मंदिराजवळ होते. ते कालौघात नष्ट झाले. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या गिरवी या आजोळी जात असताना सध्याच्या पेठेतील जागा राम मंदिरासाठी योग्य आहे असे गावकर्यांना सुचवले. त्यानंतर मंदिर उभारणी झाली. राम मंदिर व शेजारील मंडईतील हनुमान मंदिर यांचा ट्रस्ट 1993 साली केला गेला. मंदिराचा जीर्णोद्धार 1999 साली केला गेलेला आहे. गावचे कै. नरहर बंदिष्टे यांच्या घराण्यात प्रथमपासूनच दैनंदिन पूजा व उत्सव यांचा मान आहे.
बलखंडी गणेश मंदिर, साखरबावी विहीर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर नातेपुते गावाच्या नैऋत्य दिशेला जुन्या वेशीबाहेर गावाच्या ओढ्याकाठी श्री पर्वतेश्वर रस्त्यावर आहेत. मंदिर प्रमाणबद्ध चौकोनी आकारात ताशीव व घडवलेल्या दगडात आणि चुन्याने बांधलेले आहेत. वर गोल घुमट आकार व कळस आहे. दगडी सुंदर नक्षीकाम व रेखीव मूर्ती कोरलेल्या आहेत. तशा प्रकारची व आकाराची दोन मंदिरे सांगली संस्थानच्या मुख्य गणपती मंदिराशेजारी आहेत. गणेश मूर्ती ही उजव्या सोंडेची संगमरवरी दगडाची रेखीव व सुंदर आहे. त्या ठिकाणी मंदिरात एक व बाहेर एक अशी दोन समाधिस्थाने आहेत. मंदिरात असलेली दगडी समाधी ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे गणेशभक्त बलखंडी महाराजांची आहे. त्यांनीच ती गणेशमूर्ती स्थापलेली आहे असे म्हणतात. म्हणून ते समाधिमंदिर असे ओळखले जाते.
मूळ मूर्ती 1970 च्या आसपास भंगली, त्यामुळे गावकर्यांनी जयपूरहून (राजस्थान) मूर्तिकारांना आणून मूळ मूर्तीच्या साच्यावरून हुबेहूब संगमरवरी मूर्ती तयार करून घेतली व तिची प्राणप्रतिष्ठा केली. मूळ मूर्ती समुद्रात विसर्जित केली.
मंदिराच्या जमिनीचे मालक अतुलशेठ बावकर यांच्यातर्फे गणेश जयंती व गणेशोत्सव हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम साजरे होतात. दररोजची पूजाअर्चा श्रीधर कुलकर्णी परंपरेने पाहतात.
श्री भवानी माता मंदिर हे छोटे पण टुमदार मंदिर नातेपुते गावाच्या पश्चिमेला ऐतिहासिक बुरुजाजवळ छोट्या टेकडीवर आहे. गावाच्या मुख्य वतनदाराचा वाडा त्या ठिकाणी पूर्वी होता व जवळच गावाची वेस होती. भैरवनाथाचे मंदिर ओढ्याजवळ होते. त्या देवस्थानची जमीन पैठणकरांकडे आहे.
मंदिरातील भवानीदेवीची संगमरवरी मूर्ती प्रसन्न व मनोहर आहे. तिचीही पुनर्स्थापना व मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे, कारण जुनी मूर्ती भंगली. माजी सरपंच कै. नानासाहेब देशमुख यांनी ते काम केले. त्यांच्या पुढील पिढ्यांकडून दैनंदिन पूजाअर्चा व्यवस्थेचे काम ब्राह्मण पुजार्यांकडून केले जाते.
या मंदिराच्या व गिरिजापती, पर्वतेश्वर या जुन्या ऐतिहासिक मंदिरांच्या समोर भग्न सतिशीळा, वीरगळ, भग्न मूर्ती व गद्धेगळ पाहण्यास मिळतात.
साखरबावी ही भलीमोठी चिरेबंदी विहीर पर्वतेश्वर मंदिरास पश्चिमेकडील पाणंदीतून जाताना ओढ्यानजीक तुटलेल्या रहाटासह दिसते. बाव, बावी म्हणजे विहीर आणि तिचे पाणी साखरेसारखे गोड म्हणून ती साखरबावी. सातारा जिल्ह्यातील धावडशीचे राजगुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक ठिकाणी विहिरी खोदल्या व बांधल्या. त्यांपैकी ती एक सुंदर विहीर आहे व ते इतिहासातही नमूद केलेले आहे. विहिरीला खूप व चांगले पाणी आहे. तिचे पाणी कोणत्याही मोठ्या दुष्काळात आटले नाही वा कमी पडले नाही. नातेपुते गावाला पिण्याच्या पाण्याचा तोच मुख्य स्रोत 1960 पर्यंत होता. सर्व गाव साखरवाबी व तिच्याच पूर्वेला थोड्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक पांडुरंगाच्या मंदिरासमोरील आडाचे पाणी पित होते. त्याकाळी ओढाही बारा महिने वाहत होता. कालानुरूप ग्राम पंचायतीने तेथे टाकी बांधली, इंजिन-पंप बसवले व त्यानंतर 1970 च्या दशकात नळपाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली. गावाची लोकसंख्या वाढली. साखरबावी ग्राम पंचायतीची की खाजगी मालकीची या वादात अडकली व तिच्याकडे दुर्लक्ष झाले. विहिरीच्या उत्तरेला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. ते समर्थ स्थापित आहे असे म्हटले जाते. त्या मंदिराच्या खालून साखरबावीस मोठा पाण्याचा झरा आहे.
इंदूरचे राजे होळकर संस्थानची जागा, दस्तऐवज व महादेवाला वाहिलेली प्रचंड मोठी मानाची कावड व त्यास पंचधातूचे मोठे हंडे येथील चांगण कुटुंबीयांकडे होते. चैत्र महिन्यात पाडव्याच्या मुहूर्तावर त्या कावडीने पाणी ग्रामदैवत गौरीहराला वाहिले जाई. ती प्रथा चालू आहे. नातेपुते गावाचा ऐतिहासिक वारसा शोधण्याचा प्रयत्न उपलब्ध ऐतिहासिक वास्तू, त्यांचा काळ, पारंपरिक कल्पना, गावातील ज्येष्ठ व जाणत्या व्यक्ती यांच्याशी चर्चा यामधून केला आहे. परंतु प्रत्यक्षात लेखी दस्तऐवज कोठेच नाही. काही ऐतिहासिक, धार्मिक ग्रंथ आणि प्राचीन मंदिरे व पडक्या वास्तू या आधारे शोध करावा लागते. नातेपुते गावाचा उल्लेख सुमारे बारा-चौदा ऐतिहासिक महत्त्वाच्या ग्रंथांत आलेला आहे. त्यावरून ऐतिहासिक काळापासूनचे गावाचे महत्त्व लक्षात येऊ शकते.
– रविंद्र प्रभाकर चांगण
एतिहासिक खाणाखुणा जपलेल नातेपुते
आपल्या महाराष्ट्र राज्याच्या काना-कोपऱ्यात भटकंती करताना आजही अशी अनेक गावे, अनेक ठिकाणे सापडतील जी आधुनिकीकरणाच्या युगातही आपले आपले प्राचीनत्व टिकवून आहेत. असेच एक छोटेखानी गाव आहे सोलापूर जिल्ह्यातील, माळशिरस तालुक्यातील – नातेपुते. पुणे-पंढरपूर महामार्गावरील फलटण शहरापासून सुमारे ४० किमीवर नातेपुते वसले आहे. सातारा शहरापासून जायचे असल्यास शिखर शिंगणापूर ओलांडून पुढे केवळ १५ किमीवर प्रवास करून नातेपुते गाठता येते.
नातेपुते गावाचा इतिहास पाहता ह्या गावाचे पुरातन नाव नर्तकीपुर होते असे आढळते. नन्तरच्या काळामध्ये ह्याचे अपभ्रंश होऊन नातेपुते नाव अडले असावे. आधीच्या काळी संपूर्ण गाव तटबंदी-बुरुजाच्या भरभक्कम संरक्षणामध्ये वसलं होत. तटबंदीच्या परकोटाची आतमध्ये एक मुख्य कोट होता जिथे पंचक्रोशीच्या सर्व कारभाराची मुख्य कचेरी होती. आजमितीस नातेपुते गावात फेरफटका मारताना ह्या मुख्य कोटाचा केवळ एकमेव बुरुज पाहायला मिळतो. मात्र गावामध्ये भटकताना अनेक ठिकाणी पुरातन दगडी बांधकामाच्या भिंती, पुरातन जलसाठे, घरांच्या पायाचे जोते आढळतात. मात्र नातेपुते गावाचे खरे प्राचीनत्व सिद्ध करतात येथील दोन हेमाडपंथी शैलीतील मंदिरे. महाराष्ट्रामध्ये मध्ययुगीन कालखंडात सुमारे तेराव्या शतकात, यादव साम्राज्याच्या काळामध्ये हेमाडपंथी वास्तुशैलीचा उगम झाला. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे हेमाडपंथी वास्तुशैलीतील मंदिरे आढळतात निश्चितच ती ठिकाणे फार पुरातन म्हणता येतील. नातेपुते गावामध्ये अशीच दोन हेमाडपंथी मंदिरे आहेत, गिरिजापती मंदिर आणि बळीचे मंदिर. तसेच ह्या मंदिराच्या जोडीने गावामध्ये अनेक वीरगळी देखील आढळून येतात. हि सर्व प्रमाणे सिद्ध करतात कि एकेकाळी नातेपुते हि वीरांची भूमी देखील होती.
नातेपुते पासून सुमारे १५ किमीवर असलेले शिखर शिंगणापूर मंदिर तर सर्वन्यात आहेच. कारण हे आहे शिव-पार्वतीचे विवाहस्थळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत. मात्र फार कमी लोकांना हे माहित असेल कि नातेपुते हे पार्वतीचे माहेर आहे. शिव-पार्वतीच्या मिलनाची कथा आजही आपल्या येथील स्थानिक लोकसाहित्याच्या ओव्यांमधून ऐकायला मिळते
आल्याड नातंपुतं, पल्याड शिंगणापूर |
दवण्यासाठी गेला, भोळा शंकर दूर ||
वाजत्याती वाजांतरी, नात्यापुत्याच्या लवनी |
भोळ्या शंभू महादेवाचं गेलं लगीन लागुनी ||
दवणा नावाची एक सुंगंधी व औषधी वनस्पती ह्या भागात आढळते. वरील ओव्यांनुसार, ह्याच दवणा वनस्पतीच्या शोधार्थ शिवशंकर कैलासावरून नातेपुते परिसरामध्ये आले आणि इथे त्यांना देवी पार्वती दिसली. नन्तर ह्या दोघांचे शिखर शिंगणापूरला लग्न लावण्यात आले. पार्वतीचे माहेरचे नाव होते गिरीजा, म्हणून नातेपुते गावामध्ये असलेल्या शिवमंदिराला गिरिजापती मंदिर म्हणतात. तसेच पार्वतीचा भाऊ बळियाप्पा याचे मंदिर देखील गिरिजापती मंदिराच्या जवळच आहे. हि दोन्ही मंदिरे पुरातन हेमाडपंथी शैलीतील आहेत.
गिरिजापती मंदिर तुलनेने जास्त मोठे प्रशस्त असून मंदिराला चहुबाजूने भक्कम तटबंदी आहे. मंदिराला तीन मुख्य प्रवेशद्वारे आहेत. मंदिर प्रांगणात प्रवेश करताच तीन उंच दीपमाळा आपले स्वागत करतात. भरभक्कम दगडी खांब असलेला सभामंड्प, सभामंडपामध्ये विराजमान असलेला नन्दी आणि मुख्य देव-गाभारा अशी मंदिराची बांधणी आहे. मंदिरच्या शिखराची नव्याने बांधणीकेली असून सुंदर रंगकाम केले आढळते. मंदिराच्या आसपास काही पुरातन मुर्त्या देखील ठेवल्या आहेत. त्यामध्ये पार्वतीला मांडीवर घेऊन बसलेली शिवमूर्ती म्हणजे गौरीहराची मूर्ती, महिषासुरमर्दिनी आणि दुर्मिळ अशी चतुरलिंगी शिवपिंड अवश्य बघावी.
मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यावर एक शिलालेख कोरलेला आढळतो. त्या शिलालेखामध्ये शके १७८४ च्या श्रावण महिन्याचा उल्लेख आहे. ह्या काळामध्ये मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम झाले असावे. मुख्य गाभाऱ्यामध्ये चौकोनी शिवपिंडीवर शिवलिंगाऐवजी दोन शाळुंका आहेत ज्या शिव-पार्वतीचे स्थान दर्शवतात. मंदिराच्या बाहेर अनेक वीरगळी भग्नावस्थेत पडलेल्या आहेत, तसेच एक सतीशिळा देखील आढळते. स्थानिक लोकांनी ह्या वीरगळींचे आणि सतीशीळेचे योग्य जतन करून मंदिर आवारात ठेवायला हवे.
गिरिजापती मंदिराच्या जवळच आहे पार्वतीचा भाऊ बळियाप्पा म्हणजेच बळी मंदिर. हे मंदिर तुलनेने छोटे असून मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रथम शनी व हनुमानाची मूर्तीचे दर्शन होते. इथेही छोटेखानी सभामंड्प आणि गाभारा अशी रचना आढळते.
बळी मंदिराच्या बाहेरही दोन वीरगळी अर्ध्या जमिनीमध्ये गाडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. ह्या दोन हेमाडपंथी पुरातन मन्दिराखेरीज नातेपुते गावातील आवर्जून बघावे असे अजून एक मंदिर म्हणजे पर्वतेश्वर मंदिर. एका छोट्या टेकाडावर बांधलेले हे शिवमंदिर सुमारे शंभर वर्षापूर्वीचे असावे. मंदिरापर्यंत जायला उत्तम पायरीमार्ग आहे. कमानींमधून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूला पुरातन देवड्या दिसतात आणि दोन उंच दीपमाळा देखील आहेत. मंदिराचा सभामंड्प लाकडी खांबांवर बांधलेला असून गाभाऱ्यामध्ये शाळुंका असलेली शिवपिंड आहे.
पर्वतेश्वर मंदिराच्या आवारामध्ये दोन सुंदर सुस्थितीतील वीरगळी आहेत. त्यापैकी एक आहे द्वंद्वयुद्ध वीरगळ आणि एक आहे गोधन रक्षण वीरगळ. तसेच स्थानिक लोकांकडून असे सांगितले जाते कि पर्वतेश्वर मंदिराच्या मागील बाजूने एक भुयारी मार्ग होता जो थेट शिखर शिंगणापूर मंदिराकडे जात असे. मात्र सध्या हा भूयारी मार्ग बुजवलेला आढळतो.
हाताशी पुरेसा वेळ असेल नातेपुते पासून साधारण ४० किमीवर अंतरावर असलेल्या वेळापूर गावातील अर्धनारी नटेश्वरह्या पुरातन शिवमंदिराला देखील भेट देता येईल. तसेच जर दोन-तीन दिवसांचे उत्तम नियोजन केले आणि स्वतःचे वाहन असेल तर नातेपुतेच्या जवळपास आपल्याला अनेक किल्ल्यांची भटकंती देखील करता येईल. सातारा जिल्ह्यातील संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले नातेपुते पासून पहाटे लवकर निघून एका दिवसात बघता येऊ शकतात. तसेच सोलापूर जिल्ह्यातील पिलीव आणि अकलूज येथील सुंदर भुईकोट किल्लेहि पाहता येथील. यापैकी अकलूजच्या किल्ल्यामध्ये उभारलेली शिवसृष्टी तर प्रत्येक इतिहासप्रेमीने अवश्य पाहावी.
पुणे-सातारा शहरापासून जर तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार अशी एक दिवसीय छोटी, शांत, निवांत अशी सहल आयोजित करायची असेल तर नातेपुते आणि परिसर हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. एखाद्या आधीच प्रसिद्ध असलेल्या गजबजलेल्या, गर्दीच्या ठिकाणी सहलीला जाण्याऐवजी कधीतरी वाकडी वाट करून अशा आडवाटेवरील कमी विख्यात जागेला देखील भेट द्यावी. खास करून दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी व्यक्तींनी तसेच ज्यांना पुरातन मंदिरे, वीरगळी, स्मारके बघायची आवड असेल त्यांना तर नातेपुते परिसरातील मंदिरे आणि किल्ले म्हणजे एक उत्तम पर्वणी ठरेल.
गिरीजापती (गौरीहर) महादेव मंदिर , नातेपुते , ता. माळशिरस जिल्हा. सोलापूर . . . . नातेपुते गावचे हे मंदिर ग्रामदैवत असून . सदर मंदिर हे बहामनी काळात बांधले आहे असे तज्ञांचे मत आहे . मंदिराच्या जिर्णोद्धारा मध्ये मंदिराचा कळस दाक्षिणात्य शैली मध्ये बांधण्यात आला व त्याला सध्याचा नयन रम्य रंग देण्यात आला आहे . सदर देवस्थान हे "श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले" सातारा यांच्या खाजगी मालकीचे आहे . मंदिर एका उंचवाट्या वर बांधले आहे , त्याला चारही बाजूने सुंदर व भक्कम अशी तट बंदी आहे . मंदिरात प्रवेश करण्यासाठी तटाला ३ बाजूने ३ द्वारे आहेत. हेमाडपंथी शैलीतील मंदिराला ३ द्वारे असलेले सभामंडप आहे तर मंडपात ३ नंदी आहेत . सभामंडप , अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे .गर्भगृहात एका पीठावर २ लिंगे आहेत , त्यापैकी एक महादेवाचे तर दुसरे माता पार्वतीचे आहे नातेपुते पासून जवळ असलेल्या शिखर-शिंगणापूर च्या डोंगरावर शुंभु महादेवाचा व माता पार्वतीचा विवाह होतो , श्रद्धेने हे मंदिर माता पार्वतीचे माहेर समजले जाते .

No comments:
Post a Comment