धरणासारख्या मोठय़ा प्रकल्पात अनेक गावेच्या गावे बुडतात, विस्थापित होतात. या जलसंपादनात अनेकदा काही प्रेक्षणीय स्थळांनाही जलसमाधी मिळते. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूरजवळ साकारलेल्या उजनी जलाशयाचा असाच एक तडाखा पळसदेवमधील पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरांना बसला. यातील पळसनाथाचे मंदिर तर पूर्णपणे पाण्यात बुडाले तर काशी विश्वनाथाचे उपेक्षेच्या खाईत. भटकंतीचे वेड असणाऱ्यांनी मुद्दाम वाट वाकडी करून पाहावीत अशी ही दोन मंदिरे आहेत. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाराही महिने उजनी धरणाच्या पोटी लुप्त झालेलं हे मंदिर. मंदिर जरी पाण्याखाली असलं तरी खूपच तीव्र दुष्काळ असला आणि त्यातच उन्हाळा तापू लागला तरच हे मंदिर पाण्याबाहेर येतं.म्हणुनच या मंदिराचं दर्शन होणं हि भाग्याची आणि योगायोगाची गोष्ट आहे. दरवर्षी उन्हाळा तापू लागला, दुष्काळ पाण्याचा तळ गाठू लागला, की ही दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात.
पळसनाथचं शिवमंदिर
जलसमाधी मिळालेलं पळसनाथ मंदिर
जाण्याची वेळ : साधारण एप्रिल व मे. ( इतरवेळी मंदिर पाण्याखाली असते. )
जाण्याचा मार्ग : पुणे - पळसदेव (अंतर १२४ किमी), इंदापूर - २० किमी. भिगवण - २० किमी. सोलापूर - १३५ किमी. बारामती - ४० किमी.
पुण्यापासून साधारणपणे १०० किमी अंतरावर उजनी धरण आहे. पक्षी निरीक्षणसाठी प्रसिद्ध असलेली ही जागा उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर आपली स्मृतिचिन्हे दाखवू लागते. यातले एक म्हणजे धरणाच्या जलाशयात लुप्त झालेले पळसनाथ मंदिर आणि काठावर असलेले एक वैष्णव मंदिर. पुणे-सोलापूर महामार्गावर ११० किलोमीटरवर पळसदेव. इंदापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी बस इथे थांबतात. दुसरा पर्याय म्हणजे पुणे -सोलापुर मार्गावर धावणार्या रेल्वेने भिगवण स्टेशनवर उतरुन तिथून रिक्षा पकडून पुणे-सोलापुर हायवेवर जाउन तिथून पळसनाथ गावात जाण्यासाठी गाडी मिळते.हे अंतर साधारण २० कि.मी. आहे. पळसनाथ गावापासून अर्धा तासात चालत धरणाजवळ जाउन तिथून बोटीने पळसनाथ मंदीर असलेल्या बेटावर जाता येते.
जवळची ठिकाणे : कुरकुंभ - ५० किमी. अकलूज किल्ला - ५० किमी. सिद्धटेक - ५० किमी.
राहण्याची व जेवणाची सोय : हॉटेल उपलब्ध आहेत.
पळसदेव गावातला प्रवेश
पळसदेव मंदिरापर्यंतचा उजनीतून केलेला प्रवास
भिगवण वरून थोडे पुढे आलो की हायवेच्या पुलावरूनच डाव्या बाजूला उजनीच्या जलाशयात पळसनाथ मंदिराचा कळस आपल्याला दिसतो आणि आपली उत्सुकता वाढू लागते. पळसनाथ या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव गाव बुडाले. गावचा हा बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्ण न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा आकार प्राप्त झाला आहे. या जुन्या गावी आलो, की एकेकाळी तालेवार असलेल्या या पळसदेवचे वैभव जागोजागी दिसू लागते. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट, नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले. १९७५ साली जेव्हा उजनी धरण बांधून पूर्ण झालं तेव्हा त्यासाठी आजूबाजूची गावं पुनर्वसित करण्यात आली पण मंदिर कसं हलवणार?? म्हणून हे मंदिर तिथेच ठेवून आजूबाजूची गावं स्थलांतरित झाली. १९६९ साली उजनी धरणाचं बांधकाम सुरू झालं आणि १९८० च्या सुमारास ते बांधून पुर्ण झाले, त्यानंतर पाण्याची पातळी वाढल्याने पळसनाथाचं मंदिर पाण्यात गेले. पण त्यानंतर गावकऱ्यांनी पळसनाथ महादेवाचे मुख्य शिवलिंग तिथून गावात आणले व गावात नवीन मंदिर बांधून त्यात त्या शिवलिंगाची स्थापना केली. उन्हाळ्याच्या शेवटी जेव्हा पाण्याची पातळी कमी होते, तेव्हा मंदीर हळू हळू पाण्याबाहेर येते. परंतू धरण झाल्यापासून आजपर्यंत फक्त २००३ आणि २०१७ मध्ये मंदीर पूर्णपणे पाण्याबाहेर आले होते. इतर वर्षी मंदीराच्या सभामंडपात ६ फूटांपर्यंत पाणी असते.
११ व्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर आजही त्याचं अस्तित्व टिकवून थाटात उभं आहे. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला कि स्थानिक व्यक्तिशी संपर्क साधून मंदीर पाण्याबाहेर आले आहे याची खात्री करुनच इथे जाणे चांगले. कारण पाणी सुकले तरी मंदीरापर्यंत जाण्यासाठी असलेल्या वाटेवरचा गाळ पुर्णपणे सुकणे आवश्यक आहे. तसेच मंदीरे बाहेर आली कि सुरवातीला खुप गर्दी असते. त्यामुळे पुर्ण खात्री केल्याशिवाय इथे जाणे सोयीचे नाही.
भीमा नदीमधून वाहून येणारे पाणी अडवणे असा या धरणाचा उद्देश होता. थंडीपासून म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून भिगवणजवळ बरेच स्थलांतरित पक्षी येण्यास सुरुवात होते. त्यात फ्लेमिंगो हा भारतात आढळणारा सर्वात मोठा पक्षी तसेच भोरड्या म्हणजे रोझी स्टारलिंग या पक्षांचा आभाळात होणारा विलक्षण विहार ज्याला ‘मरमरेशन’ असे म्हणतात, तो पाहता येतो. काही पक्षी स्थलांतर करून येतात, त्यातले काही आता इथेच वर्षभर राहताना आढळतात.
उथळ पाण्यामुळे इथे फ्लेमिंगो पक्षी बऱ्याच संख्येने येतात. त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चाल, लांब सडक मान आणि त्यांचे उडणे या सर्व गोष्टी अतिशय रुबाबदार आणि प्रेक्षणीय असतात. भोरड्या साधारण ऑगस्ट सप्टेंबरकडे पूर्व युरोप आणि पश्चिम मध्य आशियातून येतात. या पक्षांना मधुसारिका, पळस मैना अशी नावे आहेत. खूप जास्त संख्येने असलेला त्यांचा कळप आकाशात विविध आकार करीत उडत असतो. त्यांचे ते विहरणे पाहणे हा अत्यंत वेगळाच आणि आनंददायी अनुभव असतो. ११ वे ते १३ वे शतक हा महाराष्ट्रातील भूमीज मंदिर बांधणी पद्धतीचा सुवर्णकाळ. शिलाहार-यादव अशा राजसत्तांनी या काळात महाराष्ट्रात असंख्य मंदिरे बांधली. मंदिरात जाण्यापूर्वी इतिहासाची पाने चाळली तर मंदिराला भेट देताना अजून मजा येते. अभ्यासकांच्या मते जुन्या काळात पळसदेव हे गाव "रत्नपूर" म्हणुन ओळखले जायचे बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या ह्या गावात एकूण ५ मंदिर होती. पळसदेव गावात काही मंदिरे आहे. अगदी नवीन बांधलेल्या मंदिरांजवळ पुरातन जैन प्रतिमा आढळतात. त्यामुळे पळसदेव हे गाव बरेच जुने असावे.
पळसदेव गावातून पुढे धरणपात्रात गाडी लावल्यावर मासेमारी करणाऱ्या स्थानिकांच्या होडीने १० मिनिटांत मंदिरात जाता येते. मंदिराचा परिसर देखणा आणि सुंदर असून मंदिराला चारही बाजूंनी तटबंदी(ओवऱ्या) आहेत, पण फक्त मंदिऱ्याच्या समोरील तटबंदी(ओवरी) आज चांगल्या स्थितीत आहे, बाकी ३ बाजूंच्या तटबंदी(ओवऱ्या) पाण्याच्या प्रवाहामुळे ढासळलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या शेवटी पाणी कमी झाल्यामुळे बरीच मंदिरे पाण्याबाहेर आली होती, तिथे एकूण ५ मंदिरे आहेत. त्यातील काही मंदिरे आपल्याला पाहता येतात.
मंदिराच्या आतील बाजूस असलेले खांब
भीमा नदी जिथे उत्तरवाहिनी आहे तिथे एक ओढा येऊन मिळतो त्या संगमावर शके १०७९ म्हणजे ई. स. ११५७ मध्ये चांगदेव ह्या दंडनायकाने येथे एका विष्णू मंदिराची उभारणी केली ह्या माहितीचा शिलालेख मंदिरातील एका खांबावर दिसून येतो. विष्णुमंदिर पश्चिमाभिमुख असून दोन्ही मंदिराची वास्तुरचना साधारणपणे सारखीच आहे सदर मंदिराचा कळस नष्ट झाला असून मंदिराच्या तिन्ही बाजूस विस्तृत प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील बाजू ७ दगड आहेत ज्यावर दगड पटल्यास सप्तसुरांचा प्रत्यय येतो.
मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो. आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या फेऱ्यात अडकले आहे. पाण्याच्या प्रत्येक लाटेबरोबर इथल्या या कोरीव शिळा ढासळत आहेत. जनतेचे दुर्लक्ष त्याला आणखी हातभार लावत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास हे सारे मंदिरच एके दिवशी पाण्यात लुप्त होईल. मंदिराच्या आवारात जुन्या झाडांची खोडे स्थितप्रज्ञ सारखी कणखरपणे उभी दिसतात. मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी आहे. तिची बऱ्यापैकी पडझड झाली असली तरी दिमाखदार आस्तित्व आजही कायम आहे.
काठावरच सरडेश्वर नावाचे एक विष्णु मंदिर आहे. मंदिरावर रामायण संबंधीत अनेक शिल्प कोरलेली आपल्याला आढळून येतात. सीताहरण, सीता-हनुमान यांची अशोक वनातील भेट, सेतु निर्माण करताना वानरसेना अशा अनेक मूर्ती या मंदिरात आहे. विष्णुच्या केशव अवतरातील मुर्ती येथे दिसून येते तर काही सुरसुंदरी मंदिरात आढळून येतात.
पळसनाथचा कळस व त्याचे प्रवेशद्वार
कळसावरील शिल्प
पळसनाथ च्या कळसातील प्रवेश
पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! हेमाडपंती वास्तुरचनेत तत्कालीन समयी भूमीज पद्धतीच्या शिखरांना विशेष महत्त्व होते. पळसदेवचे हे मंदिर त्यापैकी एक असून, अशा प्रकारची शिखर पद्धती तुरळक प्रमाणात होती. प्राचीन शिखरकलेत त्यावरील उभ्या पट्टय़ांना ‘रथ’, तर आडव्या प्रत्येक मजल्यास (थरास) भूमी असे म्हणतात. एकाखाली एक असे दाबलेले तरी स्पष्टपणे जाणवणाऱ्या या मजल्यांच्या शिखर पद्धतीस भूमीज शिखर पद्धत म्हणतात. येथील शिखरावर असे सात मजले असल्याने ते सप्तभूमीज पद्धतीचे शिखर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या शिखर रचनेत प्राचीन वास्तुकलेतील शुकनास प्रकारही दिसून येत आहे. या वैशिष्टय़पूर्ण शिखर पद्धतीतूनच आपल्याकडील प्रसिद्ध अशा ‘नागर’ व द्राविड या दोन शिखर पद्धती स्वतंत्रपणे पुढे आल्या. अशा पद्धतीचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंती प्रकारातील म्हणून संबोधले जाते. पळसनाथाच्या शेजारीच अजून एक मंदिर आहे, हे मंदिर बळीराजाचं किंवा सरडेश्वराचं आहे, अशी माहिती मिळते. या मंदिरात एक शिलालेख आहे, अभ्यासकांच्या मते त्या दोन्ही मंदिराचे बांधकाम अंदाजे चालुक्य काळातील म्हणजेच जवळपास १००० वर्षांपूर्वीचे असावे. साधारण बाराव्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे. स्वतःला चालुक्य म्हणून घेणारी दोन मोठी राज्य होती, त्यातील बदामीजवळ असलेले बदामी चालुक्य हे सहाव्या-सातव्या शतकात सत्तेवर होते आणि बसवकल्याण इथे असलेले कल्याण चालुक्य हे बाराव्या शतकापासून सत्तेवर होते.
मंदिराबाहेरील धर्मशाळा
धर्मशाळेच्या कमानी
पळसनाथ मंदिर व धर्मशाळा
पळसनाथ मंदिराबाहेर तटबंदी तसेच धर्मशाळा आढळून येते. बारामती येथील बाबुराव जहागीरदार यांनी सन १६८० मध्ये मंदिराचा तट व धर्मशाळा बांधली. पळसदेव हे गाव जुन्या काळी रत्नपूर या नावाने ओळखले जात होते व याठिकाणी मोठी बाजारपेठ होती.
बारमाही पाण्यात असलेले पळसनाथाचे हे मंदिर म्हणजे मानवनिर्मितीचा सुंदर अविष्कार म्हणायला हरकत नाही. पळसनाथाचे मंदिर हे २८ फुटी म्हणजे सर्वात उंच असल्याकारणाने त्याचा कळस आपणास भर पाण्यात दिसू शकतो. मंदिराचा कळस याआधी दगडी असावा नंतर तो विटांचा केला असावा. ह्या कळसाचे वैशिष्टय म्हणजे म्हणजे सदर कळसाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार आहे. शिखरावरील कळसाचा आकारही लक्षवेधी आहे. शिखरावर सर्पाकृती शिल्प आहेत.
खांबावरील नक्षीकाम
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वारावरील शिल्पकौशल्य
प्रवेशद्वारावरील खांब
आज
इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथाची
कोरीव मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी विश्वनाथ
पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा कोरीव
प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू आपल्या
मनाचा ताबाच घेते. मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना
द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले.
द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या
आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे.
सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा.
भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे. यात
रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन सेतू
बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू
त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात.पळसनाथाचा सभामंडप अतिशय सुंदर व कोरीव आहे. छपराला सुंदर नक्षीकाम आहे. मंदिराचे खांबही अतिसुंदर व कोरीव आहेत. त्याची लक्षवेधक कलाकुसर बघण्यासारखी आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूनेही छान कोरीवकाम आहे. त्यात अनेक मूर्ती, हत्ती, कमळं कोरलेली आढळतात. मंदिराच्या समोरच वीरगळ व सतीशिळा किंवा सतीचे दगड आहेत, ते आत्ता पाण्यात होते. या वीरगळीवर तत्कालीन वीरांची शौर्यगाथा कोरलेली आहे. हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे.
मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक
वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात,
..पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची
स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच
राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास पुढे 'भांडपुराण' असेही नाव पडले.
खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे
आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता
अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते. मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. मंदिराचे शिखर हे भूमीज पद्धतीमध्ये असून भाजक्या विटांचे बांधलेले आहे. मुखमंडप, गर्भगृह, सभामंडप हे बऱ्यापैकी शाबूत आहे.
नीट बघितले की या मंदिराची वेगवेगळ्या काळात दुरुस्ती झाल्याचे लक्षात येते. अशाच दुरुस्तीवेळी कधीतरी चुण्यात तयार केलेले एक ‘शरभ शिल्प’ इथे दिसते. तसेच मंदिराच्या कळसाचीही दुरुस्ती झालेली आहे आणि तो नव्याने बांधलेला आहे, असे दिसून येते.
बारमाही पाण्यात असलेले पळसनाथाचे हे मंदिर म्हणजे मानवनिर्मितीचा सुंदर अविष्कार म्हणायला हरकत नाही. पळसनाथाचे मंदिर हे २८ फुटी म्हणजे सर्वात उंच असल्याकारणाने त्याचा कळस आपणास भर पाण्यात दिसू शकतो. मंदिराचा कळस याआधी दगडी असावा नंतर तो विटांचा केला असावा. ह्या कळसाचे वैशिष्टय म्हणजे म्हणजे सदर कळसाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार आहे. शिखरावरील कळसाचा आकारही लक्षवेधी आहे. शिखरावर सर्पाकृती शिल्प आहेत.शिखर भागात सतत सूर्यप्रकाश खेळता राहावा, याकरिता चारही बाजूंनी मोठमोठे छिद्र आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा कळस आतून पूर्णपणे पोकळ आहे. आणि आतमध्ये जाण्यासाठी १ रस्ताही आहे. मंदिराच्या छतावर चढल्यावर २ फूट बाय १.५ फूट आकाराचा दिवळी वजा दरवाजा आहे. त्यातून आपल्याला झोपूनच आत जावं लागतं. कळसाच्या आत गेल्यावर एका विस्मयकारक शांततेचा अनुभव आपल्याला येतो.
मंदिराबाहेरील विरगळ
आवारातील मंदिराचे अवशेष
शिखराकडे डोळे भरून पाहिलं कि मग मंदिरात प्रवेश करायचा. मंदिराचे प्रवेशद्वार पंचशाखीय असून मंदिराला तिन्ही बाजूस प्रवेशद्वार आहे.त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंचशाखा सुस्थितीत दिसून येतात. मंदिरातील खांबांवरील नक्षीकामही देखणं आहे. मंदिरातील नक्षीकाम हे बरेचसे शाबूत आहे इतके वर्ष पाण्यात राहूनसुद्धा बांधकाम असं राहू शकत ह्याचंच आपल्याला नवल वाटतं. नंतर आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात आधी शिवपिंड होती पण गाव पुनर्वसित होताना गावकऱ्यांनी ती शिवपिंड पुनर्वसित झालेल्या गावातील मंदिरात स्थापन केली आहे. सभामंडपावरील असलेले एक शिल्प आजही लक्षवेधून घेतं ज्याच्या चहूबाजूस हनुमानाची प्रतिकृती आहे.
मंदिरातील शिलालेख
पळसदेव मंदिराचे बांधकाम कुणी केले व कधी केले याची माहिती देणारा शिलालेख हा मंदिरातच एका खांबावर कोरलेला आहे. दोन ओळींचा हा लेख असून त्या लेखाचा आशय खालीलप्रमाणे - _शके १०७९ (इ.स. ११५७) मध्ये चंगदेव या दंडनायकाने येथे एका विष्णूगृहाची उभारणी केली. ईश्वर संवत्सरामध्ये हा प्रासाद बसवण या उपाध्यायाने निर्माण केला. त्याच्या ‘भाई’ नामक पुत्राच्या ठेवीतील सोन्याची १००० नाणी तसेच या प्रासाद स्थानाशी संबंधित अकरवातोत्तर (करमुक्त भूमी) आणि १०० सुवर्ण नाण्याचा ‘दाऊपसाऊ’ (दया प्रसाद) अर्पण केला._
मंदिराबाहेरील शिल्प
सभामंडपावरील शिल्प
मंदिरावरील शिल्प
मंदिराबाहेर पडलेले काही अवशेष
या मंदिरातील शिवलिंग हे मंदिर पाण्यात जाण्यापूर्वी ३५ वर्षांपूर्वी पळसदेवच्या ग्रामस्थांनी त्या वेळी हलविले असून, नव्या गावठाणात नवीन मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आहे. तत्कालीन समयी पळसदेव ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन या मंदिरातील शिवलिंग व काही विरगळी व प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला पळसदेवच्या ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नाही. शंभर चौरस मीटरच्या भागात हे प्राचीन अवशेष मिळाले असून यामध्ये पश्चिमाभिमुख असलेले पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्टय़े या मंदिरात असून, मंदिराची ही एकूण रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मंदिराशेजारीच बलीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके १०१९ असा उल्लेख आढळल्याने त्यास लिखित आधारही प्राप्त होत आहे.
मंदिराच्या सभोवताली सुंदर तट असून आजूबाजूच्या परिसरात अनेक वीरगळी नंदी शिल्पपट पडलेले आहेत. तसेच अनेक कलाकुसर असलेले दगड अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मंदिराच्या समोरच विटांमध्ये बांधलेली प्रशस्त धर्मशाळा आहे. ह्या धर्मशाळेची प्रवेशद्वार ही हिंदू-मुस्लिम पद्धतीची आहे त्याचा आकार पाहिल्यावर आपल्या ते लक्षात येते.
काशीविश्वेश्वर मंदिर
पळसनाथाच्या मंदिराच्या मागच्या बाजूस चढावर, पाण्याच्या पलीकडे अजून एक मंदिर आहे, त्या मंदिराची प्रचंड पडझड झाली आहे. या मंदिराची खासीयत म्हणजे या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर चारही बाजूंनी रामायणातील प्रसंगांचे भरपूर शिल्प कोरलेले आहेत. परंतु या मंदिराची दुरावस्था इतकी झाली आहे, कि ते कोरीव शिल्प, मूर्ती इकडे तिकडे पडल्या आहेत. या मंदिराच्या खाली धरण पात्रात आणखी २ मंदिरे आहेत असे स्थानिकांनी सांगितात पण ती मंदिरे पुर्णपणे पाण्यात आहेत.
मंदिराच्या मागील बाजूसच एक राम मंदिर आहे. ह्या मंदिरावरील अवशेष खूप दर्शनीय आहेत. ह्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला धरणाच्या पात्रातून बाहेर यावं लागतं. बाहेरून किनाऱ्यावरून चालत गेलं तरी आपण सुमारे १५ मिनिटात देवळापाशी पोहोचतो. हेही मंदिर प्रचिन असून मंदिरावरील अप्रतिम शिल्प आपलं लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस रामायणातील बरेचशे प्रसंग आपल्या समोरून जातात सेतू बांधताना वनरसेनेचे योगदान, राम लक्ष्मणाची धनुर्धारी कला. असे बरेचसे प्रसंग ह्या मंदिरात आपल्याला शिल्परुपी आढळतात.
राम मंदिर
कधी १९७५ साली पाण्यात बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते. या वेळी पुरातत्त्व अभ्यासक, इतिहास संशोधक, पर्यटक, यात्रेकरू यांनी मोठय़ा संख्येने या मंदिरास भेट दिली होती. या वेळी हे मंदिर वाचविण्याविषयी, त्याच्या पुनरुज्जीवनाविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. पण ही फक्त चर्चाच राहिली आणि पुढच्याच पावसाळ्यात हे मंदिर पुन्हा उजनीत लुप्त झाले. खरेतर शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील साखर कारखाने, ग्रामस्थ यांनी मनावर घेतले तर पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे शेजारी मूळ गावाच्या जागीच पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. नागार्जुन कोंडा इथे धरण साकारण्यापूर्वी तिथल्या प्राचीन मंदिरांचे पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अशाच पद्धतीने अन्यत्र पुनर्वसन केल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे.
पण हा असला विचार देखील आपल्याकडे होत नाही. ही मंदिरे वाचविण्यापेक्षा आम्ही गावोगावी सध्या बेढब-रंगीबेरंगी मंदिरे आणि स्वागतकमानी उभारत आहोत. दरवर्षी इथे आले आणि इथली ढासळणारी शिल्पं पाहिली की त्रास होतो. काळजात धस्स होते. आज दिसणारे हे वैभव उद्या दिसेल का, असा प्रश्न सतावू लागतो. पळसदेवचे हे शिल्प-सौंदर्य शापित वाटू लागते! आधी पळसनाथ मग काशी विश्वेश्वर आणि नंतर हे राममंदिर बघून खरंच स्वतः नशीबवान असल्यासारखं वाटलं. इतके वर्ष पाण्यातून तावून-सुलाखून निघालेलं हे मंदिर पाण्यात असूनही शाबूत राहतंच कसं आणि पाण्याच्या होणाऱ्या आघातांपासून वाचतच कसं ?? हा साधा प्रश्न कोणाच्याही डोक्यात येऊ शकतो. त्यामुळे मंदिराच्या ह्या वारशाला सुरक्षित राहण्यासाठी मनोमन प्रार्थना करून उजनीतून निघायचे.
This was a one day trip, starting on Saturday night from Mumbai. Group Leaders had booked the bus for 24 members joining this trip.
Palasdev Temple
We started from Mumbai at 10 PM and reached Palasdev temple at dawn. Palasdeo Village is known for the Palasdev Temple, built by Chalukya Kings in Hemadpanthi style with Saptabhumij Shikhar, between 9th and 11th Century.
The temple remains submerged most of the time in the year because of the Ujani Dam built in 1978, only resurfacing in summers or during scarcity of rain in the region.
There are some hero stones and a slab depicting Dashavtars almost half buried in sand. The sunrise gave a golden hue to the temple.
Nearby, on the opposite bank, there is another ancient temple depicting Ramayana on its wall in the Wangi Region. One has to take a boat to reach the other side. Ramayana is carved on its outer wall, along with some Shilabhanjikas.
Ancient Ram Temple
There is a new temple in the called Palasnath temple, built by the villagers. The Shiva Linga from the old Palasdev Temple was placed here, when the original temple went under water.
We proceeded to Kugaon Fort, also called as Inamdar Wada. This fort also remains submerged in the River. Otherwise unexplored much, this fort gained attention when the Marathi Movie called Sairat had some drone shots of this Fort in one of its song.
On the way to Kugaon FortOne of the bastions of Kugaon Fort
या जुन्या गावी आलो, की एकेकाळी तालेवार असलेल्या या पळसदेवचे वैभव जागोजागी दिसू लागते. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट, नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले. आज इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथाची कोरीव मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी विश्वनाथ पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा कोरीव प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू आपल्या मनाचा ताबाच घेते. मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा. भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे. यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात. हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, ..पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास पुढे 'भांडपुराण' असेही नाव पडले. खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते. मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो. आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या फेऱ्यात अडकले आहे. पाण्याच्या प्रत्येक लाटेबरोबर इथल्या या कोरीव शिळा ढासळत आहेत. जनतेचे दुर्लक्ष त्याला आणखी हातभार लावत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास हे सारे मंदिरच एके दिवशी पाण्यात लुप्त होईल.
पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! हेमाडपंती वास्तुरचनेत तत्कालीन समयी भूमीज पद्धतीच्या शिखरांना विशेष महत्त्व होते. पळसदेवचे हे मंदिर त्यापैकी एक असून, अशा प्रकारची शिखर पद्धती तुरळक प्रमाणात होती. प्राचीन शिखरकलेत त्यावरील उभ्या पट्टय़ांना ‘रथ’, तर आडव्या प्रत्येक मजल्यास (थरास) भूमी असे म्हणतात. एकाखाली एक असे दाबलेले तरी स्पष्टपणे जाणवणाऱ्या या मजल्यांच्या शिखर पद्धतीस भूमीज शिखर पद्धत म्हणतात. येथील शिखरावर असे सात मजले असल्याने ते सप्तभूमीज पद्धतीचे शिखर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या शिखर रचनेत प्राचीन वास्तुकलेतील शुकनास प्रकारही दिसून येत आहे. या वैशिष्टय़पूर्ण शिखर पद्धतीतूनच आपल्याकडील प्रसिद्ध अशा ‘नांगर’ व द्राविड या दोन शिखर पद्धती स्वतंत्रपणे पुढे आल्या. अशा पद्धतीचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंती प्रकारातील म्हणून संबोधले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे मंदिर पाण्यात जाण्यापूर्वी ३५ वर्षांपूर्वी पळसदेवच्या ग्रामस्थांनी त्या वेळी हलविले असून, नव्या गावठाणात नवीन मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आहे. तत्कालीन समयी पळसदेव ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन या मंदिरातील शिवलिंग व काही विरगळी व प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला पळसदेवच्या ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नाही. शंभर चौरस मीटरच्या भागात हे प्राचीन अवशेष मिळाले असून यामध्ये पश्चिमाभिमुख असलेले पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्टय़े या मंदिरात असून, मंदिराची ही एकूण रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मंदिराशेजारीच बलीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके १०१९ असा उल्लेख आढळल्याने त्यास लिखित आधारही प्राप्त होत आहे. मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. कधी १९७५ साली पाण्यात बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते. या वेळी पुरातत्त्व अभ्यासक, इतिहास संशोधक, पर्यटक, यात्रेकरू यांनी मोठय़ा संख्येने या मंदिरास भेट दिली होती. या वेळी हे मंदिर वाचविण्याविषयी, त्याच्या पुनरुज्जीवनाविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. पण ही फक्त चर्चाच राहिली आणि पुढच्याच पावसाळ्यात हे मंदिर पुन्हा उजनीत लुप्त झाले. खरेतर शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील साखर कारखाने, ग्रामस्थ यांनी मनावर घेतले तर पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे शेजारी मूळ गावाच्या जागीच पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. नागार्जुन कोंडा इथे धरण साकारण्यापूर्वी तिथल्या प्राचीन मंदिरांचे पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अशाच पद्धतीने अन्यत्र पुनर्वसन केल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे. पण हा असला विचार देखील आपल्याकडे होत नाही. ही मंदिरे वाचविण्यापेक्षा आम्ही गावोगावी सध्या बेढब-रंगीबेरंगी मंदिरे आणि स्वागतकमानी उभारत आहोत. दरवर्षी इथे आले आणि इथली ढासळणारी शिल्पं पाहिली की त्रास होतो. काळजात धस्स होते. आज दिसणारे हे वैभव उद्या दिसेल का, असा प्रश्न सतावू लागतो. पळसदेवचे हे शिल्प-सौंदर्य शापित वाटू लागते!
पळसनाथाचा अद्भुत कळस (PALASNATH TEMPLE)
कधी कधी बऱ्याच गोष्टी मनात असतात पण त्या पूर्ण करण्यासाठी नशिबाची
सुद्धा साथ हवी असते. असंच एक ठिकाण बऱ्याच वर्षांपासून डोक्यात होतं ते
म्हणजे भिगवण जवळचं पळसनाथाचं मंदिर. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बाराही
महिने उजनी धरणाच्या पोटी लुप्त झालेलं हे मंदिर. मंदिर जरी पाण्याखाली
असलं तरी खूपच तीव्र दुष्काळ असला आणि त्यातच उन्हाळा तापू लागला तरच हे
मंदिर पाण्याबाहेर येतं.म्हणुनच या मंदिराचं दर्शन होणं हि भाग्याची आणि
योगायोगाची गोष्ट आहे. १९७५ साली जेव्हा उजनी धरण बांधून पूर्ण झालं
तेव्हा त्यासाठी आजूबाजूची गावं पुनर्वसित करण्यात आली पण मंदिर कसं
हलवणार?? म्हणून हे मंदिर तिथेच ठेवून आजूबाजूची गावं स्थलांतरित झाली. ११
व्या शतकात बांधलं गेलेलं हे मंदिर आजही त्याचं अस्तित्व टिकवून थाटात उभं
आहे ते म्हणजे भिगवणचं "पळसनाथचं शिवमंदिर"
गेल्या ३ वर्षांपासून ठरवलं होतं जेव्हा कधी हे मंदिर पूर्ण बाहेर येईल
तेव्हा बघायला जायचं. एकदा फेब्रुवारी महिन्यात बारामतीला जाऊन आलेलो
तेव्हा मित्राला सांगितलं होतं मंदिर बाहेर आलं की सांग. तसंच अचानक माझा
मित्र मुकेशचा मला फोन आला की "अरे मंदिर बाहेर आलंय" पण नुसतं मंदिर बाहेर
येऊन उपयोग नाही तर मंदिरात प्रवेश करता यायला हवं हे उद्दिष्ट होतं
म्हणून सोशल मीडियावरून तिथल्या स्थानिक मित्राचा नंबर घेतला व त्याला फोन
करून विचारलं त्याचं नाव "विशाल काळे". तो मला म्हणाला मी
तुला उद्या सकाळी बघून सांगतो. मी म्हंटलं ठीक. कारण इतक्या दूर जाऊन मला
फक्त मंदिर बघण्यात अजिबात रस नव्हता. त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी निरोप
आला की थोडा गाळ आहे पण ३-४ दिवसात मोकळं होईल. पुढच्या रविवारी आलात तर
उत्तम. पण माझे पाय काही घरात टिकत नव्हते आणि त्यात अजून १० दिवस वाट
बघायची म्हणजे अजून जड. १० दिवसात ही बातमी सगळीकडे पसरली तर त्यात गर्दीची
अजून भर म्हणजे ते शक्यच नव्हतं म्हणून मिळेल तसं शनिवारी रात्री निघायचं
ठरवलं.
रात्रीची पंढरपूर पॅसेंजर पकडून सकाळी बरोबर ८ वाजता भिगवण स्टेशनला उतरून
रिक्षा पकडली व सर्वात आधी Highway गाठला कारण पळसनाथला जायला तिकडून
गाड्या मिळतात असं कळलं. जास्त वाट न पाहता पहिली जी गाडी आली त्यात चढलो
तो होता एक टेम्पो जो शेळ्यांना घेऊन चालला होता त्यातच गावकऱ्यांशी गप्पा
मारता मारता पळसनाथ आलं.
शेळ्यांसोबतचा प्रवास
सुमारे २० किमी असलेलं हे अंतर अर्ध्या तासात कापून ९ च्या सुमारास
गावापाशी पोहोचलो. पळसनाथ मंदिर तिथून २ किमी दूर. हे अंतर मात्र चालतच
जावं लागतं. इथे जाण्यास कोणतेही वाहन नाही. सकाळची वेळ असल्याकारणाने ही
चाल सुद्धा मजेशीर वाटली नुकतेच पडलेलं ऊन गावात असलेली मंदिर, त्यात
गुलमोहराच्या झाडांनी सजवलेला साज हे पाहून नेमकं गावात आल्याचा प्रत्यय
येत होता.
चालत चालत अर्ध्या तासात धरणाजवळ जाऊन पोहोचलो अर्धा किमी अगोदरच मंदिर
दिसायला लागलं तेव्हा इतकं मस्त वाटलं त्याचं शब्दात रूपांतर नाही करू
शकत. ज्या क्षणाची इतके वर्ष वाट पाहिली ते डोळ्यासमोर दिसत होतं. थोड्याच
वेळात पाण्यापाशी जाऊन पोहोचलो बोट तयारच होती. जास्त कोणाला माहिती
नसल्याने मी एकटाच होतो. ते सगळ्यात मोठं सुख होतं. बोटवाल्यासोबत गप्पा
मारून तिथल्या भागाची माहिती घेऊन थेट मंदिराच्या जवळ जाऊन पोहोचलो.
दुष्काळसदृश्य परिस्थिती
मंदिरात जाण्यापूर्वी इतिहासाची पाने चाळली तर मंदिराला भेट
देताना अजून मजा येते. अभ्यासकांच्या मते जुन्या काळात पळसदेव हे गाव
"रत्नपूर" म्ह्णून ओळखले जायचे बाजारपेठेचे मुख्य केंद्र असलेल्या ह्या
गावात एकूण ५ मंदिर होती. भीमा नदी जिथे उत्तरवाहिनी आहे तिथे एक ओढा येऊन
मिळतो त्या संगमावर शके १०७९ म्हणजे ई. स. ११५७ मध्ये चांगदेव ह्या
दंडनायकाने येथे एका विष्णू मंदिराची उभारणी केली ह्या माहितीचा शिलालेख
मंदिरातील एका खांबावर दिसून येतो. विष्णुमंदिर पश्चिमाभिमुख असून दोन्ही
मंदिराची वास्तुरचना साधारणपणे सारखीच आहे सदर मंदिराचा कळस नष्ट झाला असून
मंदिराच्या तिन्ही बाजूस विस्तृत प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील
बाजू ७ दगड आहेत ज्यावर दगड पटल्यास सप्तसुरांचा प्रत्यय येतो.
बारमाही पाण्यात असलेले पळसनाथाचे हे मंदिर म्हणजे
मानवनिर्मितीचा सुंदर अविष्कार म्हणायला हरकत नाही. पळसनाथाचे मंदिर हे २८
फुटी म्हणजे सर्वात उंच असल्याकारणाने त्याचा कळस आपणास भर पाण्यात दिसू
शकतो. मंदिराचा कळस याआधी दगडी असावा नंतर तो विटांचा केला असावा. ह्या
कळसाचे वैशिष्टय म्हणजे म्हणजे सदर कळसाच्या आत प्रवेश करण्यासाठी एक
छोटंसं प्रवेशद्वार आहे. शिखरावरील कळसाचा आकारही लक्षवेधी आहे. शिखरावर
सर्पाकृती शिल्प आहेत.
शिखराकडे डोळे भरून पाहिलं कि मग मंदिरात प्रवेश करायचा. मंदिराचे
प्रवेशद्वार पंचशाखीय असून मंदिराला तिन्ही बाजूस प्रवेशद्वार आहे.
मंदिरातील खांबांवरील नक्षीकामही देखणं आहे. मंदिरातील नक्षीकाम हे बरेचसे
शाबूत आहे इतके वर्ष पाण्यात राहूनसुद्धा बांधकाम असं राहू शकत ह्याचंच
आपल्याला नवल वाटतं. नंतर आपण गर्भगृहात प्रवेश करतो. गर्भगृहात आधी
शिवपिंड होती पण गाव पुनर्वसित होताना गावकऱ्यांनी ती शिवपिंड पुनर्वसित
झालेल्या गावातील मंदिरात स्थापन केली आहे. सभामंडपावरील असलेले एक शिल्प
आजही लक्षवेधून घेतं ज्याच्या चहूबाजूस हनुमानाची प्रतिकृती आहे.
मंदिराच्या सभोवताली सुंदर तट असून आजूबाजूच्या परिसरात अनेक
वीरगळी नंदी शिल्पपट पडलेले आहेत. तसेच अनेक कलाकुसर असलेले दगड
अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. मंदिराच्या समोरच विटांमध्ये बांधलेली प्रशस्त
धर्मशाळा आहे. ह्या धर्मशाळेची प्रवेशद्वार ही हिंदू-मुस्लिम पद्धतीची आहे
त्याचा आकार पाहिल्यावर आपल्या ते लक्षात येते.
मंदिराच्या मागील बाजूसच एक राम मंदिर आहे. ह्या मंदिरावरील अवशेष खूप
दर्शनीय आहेत. ह्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला धरणाच्या पात्रातून बाहेर
यावं लागतं. बाहेरून किनाऱ्यावरून चालत गेलं तरी आपण सुमारे १५ मिनिटात
देवळापाशी पोहोचतो. हेही मंदिर प्रचिन असून मंदिरावरील अप्रतिम शिल्प आपलं
लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या बाहेरील बाजूस रामायणातील बरेचशे प्रसंग
आपल्या समोरून जातात सेतू बांधताना वनरसेनेचे योगदान, राम लक्ष्मणाची
धनुर्धारी कला. असे बरेचसे प्रसंग ह्या मंदिरात आपल्याला शिल्परुपी आढळतात.
आधी पळसनाथ मग काशी विश्वेश्वर आणि नंतर हे राममंदिर बघून खरंच
स्वतः नशीबवान असल्यासारखं वाटलं. इतके वर्ष पाण्यातून तावून-सुलाखून
निघालेलं हे मंदिर पाण्यात असूनही शाबूत राहतंच कसं आणि पाण्याच्या
होणाऱ्या आघातांपासून वाचतच कसं ?? हा साधा प्रश्न कोणाच्याही डोक्यात येऊ
शकतो. त्यामुळे मंदिराच्या ह्या वारशाला सुरक्षित राहण्यासाठी मनोमन
प्रार्थना करून उजनीतून मी काढता पाय घेतला.
आभार मानायचे झाल्यास त्या सर्वांची मानेन ज्यांच्यामुळे मला
ह्या मंदिराची माहिती मिळाली आणि ज्यांच्यामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकलो
त्यात माझा मित्र मुकेश आणि विशाल काळे ह्यांचं नाव मी प्रामुख्याने घेईन. मुकेशमुळे माझ्या डोक्यात पळसदेवला जायची प्रथमदर्शनी तयारी झाली आणि पळसदेवचा स्थानिक मित्र विशाल काळे ह्यामुळे मला मंदिराचे DAILY UPDATE मिळत
गेलं त्यामुळे मला मंदिराचे जे रूप पाहायचे होते ते पाहण्यास मला मदत झाली
त्याबद्दल विशाल मित्रा मी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन.
धन्यवाद.
Google Location of Palasdev Temple.
टीप :
१) मंदिराला भेट देण्यास जाण्यापूर्वी आधी चौकशी करून जाणं गरजेचं आहे नाहीतर फेरी फुकट जाऊ शकते.
आणि
२) गावातून परतताना 'तुषार कोल्ड्रिंक "मधून लिंबू सरबताचा आस्वाद नक्की घ्या कारण ते अमृत आहे तशी चव तुम्हाला घरी बनवलेल्या लिंबू सरबतातही मिळणार नाही.
पळसदेवमधील श्री पळसनाथ
पळसदेवमधील श्री पळसनाथ
धरणासारख्या मोठय़ा प्रकल्पात अनेक गावेच्या गावे बुडतात, विस्थापित होतात.
या जलसंपादनात अनेकदा काही प्रेक्षणीय स्थळांनाही जलसमाधी मिळते. पुणे
जिल्ह्य़ातील इंदापूरजवळ साकारलेल्या उजनी जलाशयाचा असाच एक तडाखा
पळसदेवमधील पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरांना बसला. यातील
पळसनाथाचे मंदिर तर पूर्णपणे पाण्यात बुडाले तर काशी विश्वनाथाचे
उपेक्षेच्या खाईत. भटकंतीचे वेड असणाऱ्यांनी मुद्दाम वाट वाकडी करून
पाहावीत अशी ही दोन मंदिरे आहेत. दरवर्षी उन्हाळा तापू लागला, दुष्काळ
पाण्याचा तळ गाठू लागला, की ही दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात.
पुणे-सोलापूर महामार्गावर ११० किलोमीटरवर पळसदेव. इंदापूर, सोलापूरकडे
जाणाऱ्या सर्व एस.टी बस इथे थांबतात. या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर
उजनी जलाशय आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव गाव बुडाले. गावचा हा
बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्ण न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा
आकार प्राप्त झाला आहे. या जुन्या गावी आलो, की एकेकाळी तालेवार असलेल्या
या पळसदेवचे वैभव जागोजागी दिसू लागते. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस
आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट,
नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस
पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ,
नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे
हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात
घेतले.
आज इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी
विश्वनाथाची कोरीव मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी
विश्वनाथ पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा
कोरीव प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू
आपल्या मनाचा ताबाच घेते. मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण
दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे
कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती
घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार
शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण
करणारा. भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे.
यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन
सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग
जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात.
हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही.
स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे.
यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, ..पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर
बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण
झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास
पुढे 'भांडपुराण' असेही नाव पडले. खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन
काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून
बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते.
मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी
परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो.
आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या
फेऱ्यात अडकले आहे. पाण्याच्या प्रत्येक लाटेबरोबर इथल्या या कोरीव शिळा
ढासळत आहेत. जनतेचे दुर्लक्ष त्याला आणखी हातभार लावत आहे. याबाबत वेळीच
उपाययोजना न केल्यास हे सारे मंदिरच एके दिवशी पाण्यात लुप्त होईल.
पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! हेमाडपंती वास्तुरचनेत तत्कालीन
समयी भूमीज पद्धतीच्या शिखरांना विशेष महत्त्व होते. पळसदेवचे हे मंदिर
त्यापैकी एक असून, अशा प्रकारची शिखर पद्धती तुरळक प्रमाणात होती. प्राचीन
शिखरकलेत त्यावरील उभ्या पट्टय़ांना ‘रथ’, तर आडव्या प्रत्येक मजल्यास
(थरास) भूमी असे म्हणतात. एकाखाली एक असे दाबलेले तरी स्पष्टपणे जाणवणाऱ्या
या मजल्यांच्या शिखर पद्धतीस भूमीज शिखर पद्धत म्हणतात. येथील शिखरावर असे
सात मजले असल्याने ते सप्तभूमीज पद्धतीचे शिखर असल्याचे तज्ज्ञांचे मत
आहे. या शिखर रचनेत प्राचीन वास्तुकलेतील शुकनास प्रकारही दिसून येत आहे.
या वैशिष्टय़पूर्ण शिखर पद्धतीतूनच आपल्याकडील प्रसिद्ध अशा ‘नांगर’ व
द्राविड या दोन शिखर पद्धती स्वतंत्रपणे पुढे आल्या. अशा पद्धतीचे मंदिर हे
महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंती प्रकारातील
म्हणून संबोधले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे मंदिर पाण्यात जाण्यापूर्वी
३५ वर्षांपूर्वी पळसदेवच्या ग्रामस्थांनी त्या वेळी हलविले असून, नव्या
गावठाणात नवीन मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आहे. तत्कालीन समयी पळसदेव
ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन या मंदिरातील शिवलिंग व काही विरगळी व
प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला पळसदेवच्या
ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नाही. शंभर चौरस मीटरच्या भागात हे
प्राचीन अवशेष मिळाले असून यामध्ये पश्चिमाभिमुख असलेले पळसनाथाचे मंदिर
कलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन
बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर,
स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्टय़े या मंदिरात असून,
मंदिराची ही एकूण रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील
कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
या मंदिराशेजारीच बलीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके १०१९ असा
उल्लेख आढळल्याने त्यास लिखित आधारही प्राप्त होत आहे.
मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज
पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. कधी १९७५ साली पाण्यात
बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते. या वेळी
पुरातत्त्व अभ्यासक, इतिहास संशोधक, पर्यटक, यात्रेकरू यांनी मोठय़ा
संख्येने या मंदिरास भेट दिली होती. या वेळी हे मंदिर वाचविण्याविषयी,
त्याच्या पुनरुज्जीवनाविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. पण ही फक्त चर्चाच
राहिली आणि पुढच्याच पावसाळ्यात हे मंदिर पुन्हा उजनीत लुप्त झाले. खरेतर
शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील साखर कारखाने, ग्रामस्थ यांनी
मनावर घेतले तर पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली
पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे शेजारी मूळ गावाच्या जागीच
पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. नागार्जुन कोंडा इथे धरण साकारण्यापूर्वी
तिथल्या प्राचीन मंदिरांचे पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अशाच पद्धतीने
अन्यत्र पुनर्वसन केल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे.
पण हा असला विचार देखील आपल्याकडे होत नाही. ही मंदिरे वाचविण्यापेक्षा
आम्ही गावोगावी सध्या बेढब-रंगीबेरंगी मंदिरे आणि स्वागतकमानी उभारत आहोत.
दरवर्षी इथे आले आणि इथली ढासळणारी शिल्पं पाहिली की त्रास होतो. काळजात
धस्स होते. आज दिसणारे हे वैभव उद्या दिसेल का, असा प्रश्न सतावू लागतो.
पळसदेवचे हे शिल्प-सौंदर्य शापित वाटू लागते!
११ वे ते १३ वे शतक हा महाराष्ट्रातील भूमीज मंदिर बांधणी पद्धतीचा सुवर्णकाळ. शिलाहार-यादव अशा राजसत्तांनी या काळात महाराष्ट्रात असंख्य मंदिरे बांधली. *मंदिर कसे पहावे* या लेखमालिकेतून आपण मंदिरांच्याविषयी माहिती पाहतो आहोत. *महाराष्ट्रातील मंदिरे* या मालिकेतून आपण काही मोजक्या मंदिरांची माहिती पाहू. पुण्यापासून साधारणपणे १०० किमी अंतरावर उजनी धरण आहे. पक्षी निरीक्षणसाठी प्रसिद्ध असलेली ही जागा उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यावर आपली स्मृतिचिन्हे दाखवू लागते. यातले एक म्हणजे धरणाच्या जलाशयात लुप्त झालेले पळसनाथ मंदिर आणि काठावर असलेले एक वैष्णव मंदिर. पळसदेव मंदिराचे बांधकाम कुणी केले व कधी केले याची माहिती देणारा शिलालेख हा मंदिरातच एका खांबावर कोरलेला आहे. दोन ओळींचा हा लेख असून त्या लेखाचा आशय खालीलप्रमाणे - _शके १०७९ (इ.स. ११५७) मध्ये चंगदेव या दंडनायकाने येथे एका विष्णूगृहाची उभारणी केली. ईश्वर संवत्सरामध्ये हा प्रासाद बसवण या उपाध्यायाने निर्माण केला. त्याच्या ‘भाई’ नामक पुत्राच्या ठेवीतील सोन्याची १००० नाणी तसेच या प्रासाद स्थानाशी संबंधित अकरवातोत्तर (करमुक्त भूमी) आणि १०० सुवर्ण नाण्याचा ‘दाऊपसाऊ’ (दया प्रसाद) अर्पण केला._ पळसनाथ मंदिराबाहेर तटबंदी तसेच धर्मशाळा आढळून येते. बारामती येथील बाबुराव जहागीरदार यांनी सन 1680 मध्ये मंदिराचा तट व धर्मशाळा बांधली. पळसदेव हे गाव जुन्या काळी रत्नपूर या नावाने ओळखले जात होते व याठिकाणी मोठी बाजारपेठ होती. मंदिराचे शिखर हे भूमीज पद्धतीमध्ये असून भाजक्या विटांचे बांधलेले आहे. मुखमंडप, गर्भगृह, सभामंडप हे बऱ्यापैकी शाबूत आहे. मंदिराच्या आवारात मुर्ती इतरत्र पडलेल्या आढळून येतात. काठावरच सरडेश्वर नावाचे एक विष्णु मंदिर आहे. मंदिरावर रामायण संबंधीत अनेक शिल्प कोरलेली आपल्याला आढळून येतात. सीताहरण, सीता-हनुमान यांची अशोक वनातील भेट, सेतु निर्माण करताना वानरसेना अशा अनेक मूर्ती या मंदिरात आहे. विष्णुच्या केशव अवतरातील मुर्ती येथे दिसून येते तर काही सुरसुंदरी मंदिरात आढळून येतात.
पळसदेवमधील श्री पळसनाथ
धरणासारख्या मोठय़ा प्रकल्पात अनेक गावेच्या गावे बुडतात, विस्थापित होतात. या जलसंपादनात अनेकदा काही प्रेक्षणीय स्थळांनाही जलसमाधी मिळते. पुणे जिल्ह्य़ातील इंदापूरजवळ साकारलेल्या उजनी जलाशयाचा असाच एक तडाखा पळसदेवमधील पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरांना बसला. यातील पळसनाथाचे मंदिर तर पूर्णपणे पाण्यात बुडाले तर काशी विश्वनाथाचे उपेक्षेच्या खाईत. भटकंतीचे वेड असणाऱ्यांनी मुद्दाम वाट वाकडी करून पाहावीत अशी ही दोन मंदिरे आहेत. दरवर्षी उन्हाळा तापू लागला, दुष्काळ पाण्याचा तळ गाठू लागला, की ही दोन्ही मंदिरे व्यवस्थित पाहता येतात.
पुणे-सोलापूर महामार्गावर ११० किलोमीटरवर पळसदेव. इंदापूर, सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व एस.टी बस इथे थांबतात. या गावापासून उत्तरेला दोन किलोमीटरवर उजनी जलाशय आहे. या जलाशयातच १९७५ साली मूळ पळसदेव गाव बुडाले. गावचा हा बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्ण न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा आकार प्राप्त झाला आहे. या जुन्या गावी आलो, की एकेकाळी तालेवार असलेल्या या पळसदेवचे वैभव जागोजागी दिसू लागते. प्राचीन काळी पळसदेव ही एक भरभराटीस आलेली बाजारपेठ होती. गावाभोवती तट होता. या तटाला चार वेशी होत्या. भट, नाथ, चांभार आणि मुख्य अशी त्यांची नावे. गावाभोवतीने वाहणाऱ्या भीमेस पश्चिमेपासून उत्तरेपर्यंत घाट होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पळसनाथ, नागनाथ आणि काशी विश्वनाथाची उत्तम बांधणीची मंदिरे होती. पण १९७५ साली इथे हा जलाशय साकारला आणि अन्य गावांबरोबरच पळसदेवलाही उजनीने आपल्या पोटात घेतले.
आज इथे फिरू लागलो, की धरणात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथाची कोरीव मंदिरे आल्या-आल्या लक्ष वेधून घेतात. यातील काशी विश्वनाथ पाण्याच्या काठावर. धरणाच्या पाण्यात पाय सोडून बसलेले. त्याचा कोरीव प्राकार दुरूनच लक्षात येतो. जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता जणू आपल्या मनाचा ताबाच घेते. मंदिर पश्चिमाभिमुख. पश्चिम, उत्तर व दक्षिण दिशांना द्वारमंडप, सभागृह आणि गर्भगृह अशी त्याची रचना. शिखर पूर्णपणे कोसळलेले. द्वारमंडप व सभामंडपातील खांब कोरीव, रेखीव छत, तर बाह्य़ भिंती घडय़ांच्या आकारात दुमडत बांधलेल्या. त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे, उठावदार शिल्पे. सारा प्राकारच एखाद्या अद्भुत जागी उभे असल्याचा भास निर्माण करणारा. भिंतीवरील सारी शिल्पे आजही जिवंत. अगदी काल-परवा कोरल्याप्रमाणे. यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग. अशोकवनातील ती सीता, हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर, समुद्रातील जलसृष्टी, राम-रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा बांधू पाहतात.
हे सारे पाहत आतमध्ये गाभाऱ्यात यावे. मात्र इथे कुठलीही मूर्ती दिसत नाही. स्थानिक गावकरी सांगतात, की अनेक वर्षांपासून देवतेविनाच हे मंदिर आहे. यासाठी ते इथे एक दंतकथाही पुरवतात, ..पांडवांनी एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधले, पण इथे कुठल्या देवतेची स्थापना करायची, यावरून त्यांच्यात भांडण झाले. शेवटी हे मंदिर देवतेविनाच राहिले. पुराणातील भांडणावरून या मंदिरास पुढे 'भांडपुराण' असेही नाव पडले. खरेतर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात कधीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हलविली असण्याची शक्यता वाटते. मंदिराच्या रचनेवरून ते हजारएक वर्षे प्राचीन नक्कीच असावे, यासाठी परिसरातीलच बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते. असो. आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या फेऱ्यात अडकले आहे. पाण्याच्या प्रत्येक लाटेबरोबर इथल्या या कोरीव शिळा ढासळत आहेत. जनतेचे दुर्लक्ष त्याला आणखी हातभार लावत आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास हे सारे मंदिरच एके दिवशी पाण्यात लुप्त होईल.
पळसनाथाचे मंदिरही असेच कोरीव-कलात्मक! हेमाडपंती वास्तुरचनेत तत्कालीन समयी भूमीज पद्धतीच्या शिखरांना विशेष महत्त्व होते. पळसदेवचे हे मंदिर त्यापैकी एक असून, अशा प्रकारची शिखर पद्धती तुरळक प्रमाणात होती. प्राचीन शिखरकलेत त्यावरील उभ्या पट्टय़ांना ‘रथ’, तर आडव्या प्रत्येक मजल्यास (थरास) भूमी असे म्हणतात. एकाखाली एक असे दाबलेले तरी स्पष्टपणे जाणवणाऱ्या या मजल्यांच्या शिखर पद्धतीस भूमीज शिखर पद्धत म्हणतात. येथील शिखरावर असे सात मजले असल्याने ते सप्तभूमीज पद्धतीचे शिखर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या शिखर रचनेत प्राचीन वास्तुकलेतील शुकनास प्रकारही दिसून येत आहे. या वैशिष्टय़पूर्ण शिखर पद्धतीतूनच आपल्याकडील प्रसिद्ध अशा ‘नांगर’ व द्राविड या दोन शिखर पद्धती स्वतंत्रपणे पुढे आल्या. अशा पद्धतीचे मंदिर हे महाराष्ट्र राज्यात दुर्मिळ असून त्यांना होयसाळ हेमाडपंती प्रकारातील म्हणून संबोधले जाते. या मंदिरातील शिवलिंग हे मंदिर पाण्यात जाण्यापूर्वी ३५ वर्षांपूर्वी पळसदेवच्या ग्रामस्थांनी त्या वेळी हलविले असून, नव्या गावठाणात नवीन मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली आहे. तत्कालीन समयी पळसदेव ग्रामस्थ बंधूंनी पुढाकार घेऊन या मंदिरातील शिवलिंग व काही विरगळी व प्राचीन मूर्ती नवीन गावात आणल्या. जुन्या मंदिराला पळसदेवच्या ग्रामस्थांनी श्रद्धेपोटी हातही लावला नाही. शंभर चौरस मीटरच्या भागात हे प्राचीन अवशेष मिळाले असून यामध्ये पश्चिमाभिमुख असलेले पळसनाथाचे मंदिर कलेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, तीन बाजूस कक्षासन, कोरीव स्तंभ, गर्भगृहाचे प्रवेशद्वार, त्यावरील पुष्प, नर, स्तंभ, लता व व्याल अशा पंचशाखा अशी अनेक वैशिष्टय़े या मंदिरात असून, मंदिराची ही एकूण रचना व त्याची कलापद्धती पाहता हे उत्तर चालुक्य काळातील कल्याणी चालुक्याच्या राजवटीतील असावे असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या मंदिराशेजारीच बलीच्या मंदिरात सापडलेल्या शिलालेखात शके १०१९ असा उल्लेख आढळल्याने त्यास लिखित आधारही प्राप्त होत आहे.
मात्र आज ते पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. त्याचे उंच गेलेले सप्तभूमिज पद्धतीचे शिखर तेवढे पाण्यातून वर डोकावताना दिसते. कधी १९७५ साली पाण्यात बुडालेले हे मंदिर २००१ मधील दुष्काळात पूर्णपणे उघडे पडले होते. या वेळी पुरातत्त्व अभ्यासक, इतिहास संशोधक, पर्यटक, यात्रेकरू यांनी मोठय़ा संख्येने या मंदिरास भेट दिली होती. या वेळी हे मंदिर वाचविण्याविषयी, त्याच्या पुनरुज्जीवनाविषयी मोठी चर्चा सुरू झाली होती. पण ही फक्त चर्चाच राहिली आणि पुढच्याच पावसाळ्यात हे मंदिर पुन्हा उजनीत लुप्त झाले. खरेतर शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुक्यातील साखर कारखाने, ग्रामस्थ यांनी मनावर घेतले तर पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली पळसनाथ व काशी विश्वनाथ या दोन्ही मंदिरांचे शेजारी मूळ गावाच्या जागीच पुनर्वसन करणे सहज शक्य आहे. नागार्जुन कोंडा इथे धरण साकारण्यापूर्वी तिथल्या प्राचीन मंदिरांचे पुरातत्त्व विभागाच्या मदतीने अशाच पद्धतीने अन्यत्र पुनर्वसन केल्याचे आपल्याकडे उदाहरण आहे.
पण हा असला विचार देखील आपल्याकडे होत नाही. ही मंदिरे वाचविण्यापेक्षा आम्ही गावोगावी सध्या बेढब-रंगीबेरंगी मंदिरे आणि स्वागतकमानी उभारत आहोत. दरवर्षी इथे आले आणि इथली ढासळणारी शिल्पं पाहिली की त्रास होतो. काळजात धस्स होते. आज दिसणारे हे वैभव उद्या दिसेल का, असा प्रश्न सतावू लागतो. पळसदेवचे हे शिल्प-सौंदर्य शापित वाटू लागते!
No comments:
Post a Comment