Saturday, November 4, 2023

काही एतिहासिक पोस्ट

 https://mr.quora.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%80
 
 संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) येथे काम केले (2009–2014)3 वर्षे अपडेट केले

याचे विजय आपटे यांनी सांगितलेल्या कारणासोबतच आणखी एक कारण आहे. मराठवाडा आज जरी मागास दिसत असला तरी पूर्वी तसे नव्हते. कमी परंतू भरवशाचे पर्जन्यमान आणि गोदावरी, पूर्णा, मांजरा, सिंदफणा इ. नद्यांच्या खोर्‍यातील सुपीक जमीन यामुळे मराठवाडा हा पूर्वीपासून ज्वारी सारखी धान्ये आणि कापसाचे कोठार म्हणून ओळखला जायचा. याउलट, पश्चिम महाराष्ट्राचा सह्याद्रीचा भाग हा जास्त पावसामुळे तर पूर्वेकडचा भाग हा पर्जन्यछायेच्या प्रभावात असल्याने बहूतांश भाग हा शेतीसाठी उपयुक्त नव्हता. यामुळेच पूर्वीपासून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेने अधिक संपन्न होता. इथे राज्यकरणारे सहाजीकच मग संपन्न होेते. अर्थातच शेकडो वर्षे इथे अनेक राज्ये होउन गेली. पुढील गोष्टी इथे लक्षात घेण्यासारख्या आहेत.

१. दोन मोठी संपन्न मराठी साम्राज्ये सातवाहन आणि सेऊन-यादव यांच्या राजधान्या आजच्या मराठवाड्यात अनुक्रमे प्रतिष्ठान (पैठण) आणि देवगिरी इथे होत्या.

२. सातवाहन, वाकाटक काळात मुख्य व्यापरी मार्ग हा मराठवाड्यातून जात असे. भोकरदन (जालना जि.), तेर (उस्मानाबाद जि.) हि व्यापाराची मोठी केंद्रे होती.

३. राष्ट्रकूट, चालूक्य या काळात राजधानी जरी मराठवाड्यात नसली तरी मराठवाड्याचे महत्व अजीबात कमी झाले नाही.

४. शिवाजी महाराजांची देवगिरीवर भगवा फडकविण्याची इच्छा होती (कदाचित राजधानी बनविण्याची इच्छा असावी). दुर्दैवाने त्यांच्या हयातीत ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.

५. मराठवाड्यावर मुघलांचा कब्जा होण्याआधी निजामाने (मूळ भारतीय) त्यांच्याशी तीव्र संघर्ष करणे तसेच मुघलोत्तर निजामाने (मूळ तुर्की) लवचिक धोरण अवलंबने.

या सगळ्या गोष्टी मराठवाड्याचे महत्व सांगतात.

मराठवाडा स्वराज्यात घेण्याची संधी चालून आली ती छ. शाहू-बाजीराव पे. यांच्या काळात. परंतू विजय आपटे यांनी याच प्रश्नाला उत्तर देतांना सांगितल्या प्रमाणे अल्पसंतुष्ट असल्याने मराठे युद्धात जिंकत पण तहात हारत. मराठवाड्यासारखा संपन्न प्रदेश निजाम इतक्या सहजासहजी सोडेल याची शक्यता मुळीच कमी होती. यातूनच मग १७४३ मध्ये झालेल्या पालखेडच्या तहात निजामाने मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देण्याचे मान्य केले. अर्थातच निजाम हा कर स्वत:च्या खिशातून देणार नव्हता. हा भार पडला तो थेट सामान्य जनतेवर. इथे बाजीरावांनी मराठी भाषिक प्रदेश स्वराज्यात घेण्या ऐवजी तिथून मिळणार्‍या कराला महत्व दिले. मराठा साम्राज्याच्या भारतभर झालेल्या विस्तारात या कराची मोठी मदत झाली असणार. मग मराठवाडा स्वराज्यात आहे काय किंवा नाही काय, पेशव्यांनी त्याचा विचार केला नाही.

माझ्यामते मराठवाडा स्वराज्यात न घेणे ही पेशव्यांची केवळ चूक नव्हती, तर आपल्याच जनतेवर केलेला मोठा अन्याय होता. याचे मराठवाड्यावर दूरगामी परीणाम झाले. मराठवाड्याची आर्थिक स्थिती खराब होण्याला इथुनच सुरूवात झाली. दीर्घकाळापर्यंत इथे चांगले वैचारिक नेतृत्व येऊ शकले नाही. प. महा. आणि मराठवाड्यात आज एक मोठी वैचारीक, सामाजिक, आर्थिक दरी दिसून येते. मराठवाड्याच्या आजच्या वाईट स्थितीचे मूळ असे एका चूकीच्या तहात दडले आहे. मराठवाड्याने ई.स. पू. २०० ते ई.स.१५०० असे जवळपास १७०० वर्षे महाराष्ट्राचे भाषिक व सांस्कृतिक (तसेच बराच काळ राजकीय देखील) नेतृत्व केले पण त्याच मराठवाड्याला आज सावत्र वागणूक देण्यात येते. जर मराठवाडा स्वराज्यात असले असते तर कुणास ठाऊक, आज देवगिरी अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक व राजकीय राजधानी असली असती.

 

आदिलशाहीत (विजापुर) असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तो त्यांच्याकडेच ठेवला. शहाजीराजांनी आपले पुत्र शिवाजी महाराजांना पुण्यात स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनी शिवरायांना दिली. शिवाजीराजांनी स्वराज्याचा कारभार मोठ्या जोमाने सुरू केला होता. किल्ले जिंकण्याची जोरदार मोहीम राजांनी सुरू केली होती . शिवाजीराजे एक एक मोहीम फत्ते करून यश मिळवत होते . तोरणागड जिंकला, राजगड बांधला ,कोंढाणा, पुरंदर, रायगड, प्रतापगड हे सर्व किल्ले भराभर जिंकले. तिकडे शहाजीराजे कुतूबशहाकडे (गोवळकोंडा, तेलंगणा) जाण्याच्या तयारीत होते .

विजापुरी आदिलशहा काळजीत पडला. त्याच्या राज्याचे अनेक भाग शिवाजीराजांनी काढून घेतले. शिवाजीराजांचा स्वराज्याचा वारू इकडे चौफेर उधळू लागला .त्यामुळे आदिलशहा संतापाने बेफाम झाला. रणदुल्लाखान हा सरदार शहाजीराजांचा जिवलग मित्र होता; पण त्याचे निधन झाल्यानंतर मुस्तफाखान आणि अफजलखान अत्यंत शक्तिमान बनले . त्यांनी आदिलशहाकडे शिवाजीराजे,शहाजीराजे आणि संभाजी राजे (शहाजीराजांचे जेष्ठ पुत्र) यांच्याबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. शहाजी ,संभाजी आणि शिवाजी हे तिघे मिळून बंडखोरी करत आहेत अशी आदिलशहाची खात्री होऊ लागली होती. म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना धमकीचे पत्र देऊन शिवाजीराजांना आवरण्यासाठी ताकीद दिली .

शिवाजीच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यां कारवायांना फूस आहे या संशयाने शहाजीराजे आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांना जायबंद करून त्यांचा बंदोबस्त करण्याचे आदिलशहाने ठरवले.आदिलशहाने त्यासाठी तिहेरी शक्कल लढवली .शहाजीराजांची अटक, संभाजीराजे (शहाजीराजांचे जेष्ठ पुत्र) यांचा पराभव आणि शिवाजीराजांचा बंदोबस्त. आदिलशहाने मुख्य वजीर नवाब मुस्तफाखानाला शहाजी राजे यांच्या अटकेचे आदेश दिले , फरदिखानास संभाजीराजांचा पराभव करण्यास सांगितले तर ,फत्तेखानास पुण्याकडे पाठवून शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिला.

शहाजीराजांना या कटकारस्थानाचा सुगावा लागू दिला नाही . त्यावेळी ते कर्नाटकातील जिंजीजवळ लढत होते. शहाजीराजांचे कर्तव्य मुस्तफाखान चांगलेच ओळखून होता .त्यामुळे त्याने मोठी सावधगिरी बाळगली होती. शहाजीराजांसारख्या शूर व लढाऊ योद्ध्याला समोर जाऊन अटक करणे कोणालाच शक्य नव्हते. तेव्हा कपटाने किंवा बेसावधपणे शहाजीराजांना कैद करण्याची योजना त्यांने आखली . मुस्तफाखानाने अफजलखान ,मुधोळचे बाजी घोरपडे व काही मुसलमान सरदार शहाजीराजांच्या गोटावर पाठवून दगा देऊन राजे झोपेत असतानाच त्यांच्या छावणीवर हल्ला करून पकडण्याचा प्रयत्न केला . हल्ला झाल्यानंतर झोपेत असल्यामुळे शहाजीराजे थोडे गोंधळले .मात्र लगेचच ते सावध झाले व घोड्यावर स्वार होऊन लढावयास तयार झाले . छावणीवर गडबड -गोंधळ उडाला .या गोंधळात शहाजी राजे घोड्यावरून खाली कोसळले. याच संधीचा फायदा घेऊन मुधोळच्या बाजी घोरपडे यांनी शहाजीराजांना पकडून कैद केले. कैद झालेल्या शहाजीराजांना आणण्यासाठी अफजलखानाची नेमणूक झाली. त्याला तेवढेच हवे होते .त्याने मोठ्या आनंदाने चोखपणे शहाजीराजांची जणू धिंडच काढली. बेड्या घालून, साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात २५ जुलै, १६४८ ला हजर करण्यात आले.

शहाजीराजांना कैद केल्याबरोबर बेंगलोर व कोंढाणा हस्तगत करण्यास आदिलशहाने फौजा रवाना केल्या. फरदीखान मोठ्या संख्येने संभाजीराजांच्या वर चालून गेला .पण संभाजीराजांच्या स्वतःच्या सतरा हजारांच्या फौजेस दक्षिणेतील हिंदू संस्थानिकांनी संभाजीराजांना पाठिंबा दिल्याने व त्यांचीही फौज येऊन संभाजीराजांना मिळाल्याने राजांच्या फौजेपुढे फरदीनखान यांची भंबेरी उडाली .संभाजीराजांनी फरदिखानाला सपशेल पराभुत केले. आदिलशहाचे मनसुबे धुळीला मिळत होते .

शहाजीराजांच्या अटकेची खबर राजगडावर आली. मुस्तफाखानाने व बाजी घोरपडे याने दगा करून शहाजीराजांना अटक केली होती. माणसे मारून ,छावणी लुटून, शहाजीराजांना जखमा करून त्यांना कैद केले होते. या बातमीने राजगड सुन्न झाला होता. जिजाऊंच्या सौभाग्यावर व त्यांच्या कुंकवावरच मुस्तफाखानाने घाला घातला होता. जिजाऊ आणि शिवाजीराजांच्या हृदयाचा थरकाप उडाला होता. केवढे भयंकर मोठे संकट स्वराज्यावर चालून आले होते. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. शहाजीराजांची विजापूरच्या आदिलशहाच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.

शहाजीराजांना त्यांच्या जहागिरीतील बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले.महाराष्ट्रातील स्वराज्य हे छत्रपती शिवरायांनी बघावे व कर्नाटकातील राज्य हे संभाजी राजे यांनी बघावे अशी शहाजी राजे यांची इच्छा होती. मात्र अफजलखानाने थोरल्या संभाजी महाराजांची कपट करून हत्या घडवून आणली. थोरल्या संभाजी महाराजांची समाधी कर्नाटकातील कणकगिरी (जिल्हा कोप्पल) येथे आहे. शहाजी राजे कर्नाटकासारख्या ठिकाणी १५ ते २० हजारांची फौज बाळगून होते. तेथील जनतेच्या हितासाठी ते अहोरात्र लढत होते. तेथील प्रजा शहाजीराजांना आपला आधारस्तंभ मानत होती.

पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा नाल्यातील एका वेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्यंकोजीराजांनी (शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ- तमिळनाडूमधील तंजावरचे राजे) राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी (जिल्हा दावणगिरी- कर्नाटक) येथे बांधली.

 

मयूर क्षीरसागर साठी प्रोफाइल फोटो

छत्रपती शिवाजी महाराजांना जर खरे कुणी ओळखले असेल,डोळसपणे पारखले असेल तर ते फक्त तिघांनीच…..!!

  1. राजमाता जिजाबाई.
  2. समर्थ रामदास स्वामी.
  3. औरंगजेब.

औरंगजेब शाहजादा म्हणून दख्खनमध्ये सुभेदारीवर असताना त्याने प्रथमच शिवाजीराजे हे नाव ऐकले (इ.स.१६५०-५५ दरम्यानच्या काळात).यानंतर पुढील जवळजवळ तीन दशके त्याने छत्रपतींचा झंझावाती पराक्रम बघितला.

जुन्नरची लूट,अहमदनगरवरील हल्ला,अफजलखान स्वारी व वध,सिद्दी जौहर स्वारी व पन्हाळगडावरून सुटका,कारतलबखानाचा पराभव,शायिस्तेखानाची स्वारी व लाल महालातील छापा,दिलेरखानाची फजिती,सुरतेची दोनदा लूट,जसवंतसिंहाचा पराभव,बाजी घोरपडेचा वध या सर्व प्रकरणांमुळे त्याला महाराजांच्या पराक्रमाची चांगलीच कल्पना आली होती.याचा कळस झाला तो मात्र आग्र्याचा दरबार,दरबारातील महाराजांचा 'तो' स्वाभिमानी बाणा व त्यानंतरचे राजकारण व सर्वांत शेवटी आग्र्याहून धाडसी सुटका.

यानंतर आग्र्याहून परतल्यानंतर चार वर्षांनी महाराजांनी पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने हर हर महादेव चा उदघोष केला व त्यानंतर अशी घौडदौड केली की पुरंदरच्या तहाचे घाव,आग्र्यातील अपमान सारे सारे व्याजासकट धुवून निघाले.महाराजांच्या पराक्रमी भवानी तलवारीने पुन्हा त्यानंतर कधीही म्यान बघितली नाही.आग्र्यातील स्वतःची फजिती, पुरंदरच्या तहात मिळालेले २३ किल्ले गमावणे,सुरत व कारंजाची लूट,साल्हेरचा संग्राम व मुघलांचा दणदणीत पराभव,दिंडोरीची लढाई व पराभव यांसारख्या घटनांमुळे तो अस्वस्थ झालेला होता.

या पराक्रमाचा सर्वोत्कृष्ट कळसाध्याय म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक,छत्रपतीपद धारण करणे आणि दक्षिण दिग्विजय होय.याचप्रमाणे बहादूरखान,दिलेरखान यांचा केलेला पराभव होय.या सर्व घटनांमुळे तत्कालीन प्रबळ व वैभवशाली अशा हिंदवी स्वराज्याची व राजा शिवछत्रपतींच्या सामर्थ्याची सर्व सुलतानांना विशेषतः औरंगजेबाला पुरेपूर कल्पना आली होती.

जर औरंगजेब महाराज हयात असताना दख्खनमध्ये उतरता,तर त्याला त्याचा,त्याच्या लाल किल्ल्यासकट संपूर्ण मुघल साम्राज्याचा वसीयतनामा (वारसापत्र) तयार करूनच दख्खनमध्ये पाऊल टाकावे लागले असते.

जर तो राज्याभिषेक सोहळ्यानंतर दख्खनमध्ये ससैन्य आला असता,तर

  1. त्याला महाराजांनी प्रत्यक्ष स्वराज्यात घुसू न देता स्वराज्याच्या सीमेबाहेरच बुकलले असते.
  2. जरी तो स्वराज्यात आला असता,तर त्याला एकतर
    1. मृत्यू स्वीकारावा लागला असता.
    2. अंतिम पराभव स्वीकारून कैद पत्करावी लागली असती.
    3. अन्यथा नेहमीसारख्या महाराजांच्या अचाट प्रयोगामुळे त्याची जबरदस्ती फजिती होऊन त्याला परत दिल्लीला परतावे लागले असते.थोडक्यात पराभवच नशिबी आला असता.
  3. आपण जर स्वत:हून दख्खनेत मोहिमेवर गेलो,तर आपली जागतिक प्रतिष्ठा धुळीला मिळेल,दख्खनमध्ये तिची माती होईल,मुघल साम्राज्याला घरघर लागेल,तिला कुणीही वाली राहणार नाही,अशी भीती त्याला मनात होती.हे खरेच होते.कारण औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला कुणी समर्थ बादशहा लाभला नाही.औरंगजेबाच्या मृत्यूसोबतच मुघल साम्राज्याचेही पतन सुरु झाले.
  4. औरंगजेबाची व छत्रपतींची पहिली व शेवटची भेट ही आग्य्राच्या दरबारात झाली.जर दुसरी भेट राज्याभिषेकानंतर झाली असती,तर ती केवळ रणांगणावरच झाली असती.शिवाय दोघेही आग्रा प्रकरणामुळे संतप्त झाले असल्यामुळे जी गाठ पडली असती,तर ती रणांगणावरच पडली असती.यावेळी महाराजांनी अद्वितीय रणकौशल्य दाखवून व अप्रतिम व्यूहरचना आखून नक्कीच औरंगजेबाचा पराभव केला असता.अवघ्या मराठ्यांनी मग अखिल हिंदुस्थानात नुसता हलकल्लोळ केला असता व उच्छाद मांडला असता.
  5. या सर्व शक्यतांमुळे व मनातील भीतीमुळे औरंगजेबाने महाराज हयात असेपर्यंत दख्खनमध्ये यायचे टाळले.यामुळेच त्याने त्याच्या विविध सरदारांना आळीपाळीने स्वराज्यावर स्वारी करण्याचा आदेश दिला;मात्र तो प्रत्यक्ष आला नाही.महाराज निवर्तल्यानंतर मात्र दोन वर्षांनी स्वतः पाच लाखांच्या सैन्यासह आला व या दख्खनच्या मातीतच कायमचा गाडला गेला.

यातच महाराजांची थोरवी दिसून येते.

 लेखकाकडे 775 उत्तरे आहेत व 1 कोटी वेळा उत्तरे पाहिली गेली आहेत3 वर्षे

मस्तानीचा आठव्या पिढीतला वंशज, उमर अली बहादूर म्हणतो कि

" मस्तानीचा मुलगा समशेर काशीबाईच्या देखरेखीखाली वाढला. पेशव्यांच्या कोकणस्थ ब्राह्मण परिवाराने समशेरच्या ‘मुस्लिम’ असण्यावर आक्षेप न घेता त्याला सामावून घेतले. त्याचा धर्म बदलणे पेशव्यांना सहज शक्य होते; मात्र, समशेरला त्यांनी धर्मापासून तोडले नाही. त्यामुळे मीही माझी जात ‘कोकणस्थ ब्राह्मण मुसलमान’ अशी सांगतो’,

मस्तानी होती तरी कोण? तिची आई कोण आहे या बद्दल दोन मतभिन्नता आहे

  1. बुंदेल भागातील पन्ना संस्थानचे महाराज छत्रसाल यांना रुहानीबाई या उपपत्नीपासून झालेली कन्या रत्न , म्हणजे मस्तानी. रुहानीबाई हैद्राबादच्या निजामाच्या दरबारी नृत्यांगना होती.
  2. मस्तानी छत्रसालास त्याच्या पर्शियन पत्नीपासून झालेली मुलगी असल्याचेही स‌ांगितले जाते.

पुण्यात असताना पेशवे कुटुंबीयांच्या विरोधामुळे मस्तानीला कधीच शनिवारवाड्यामध्ये वास्तव्य करू देण्यात आले नाही. याच शनिवारवाड्यात एका दरवाजाला मस्तानी दरवाजा असे नाव मिळालेले आहे. आजही तेच नाव आहे.मस्तानीचा नातू अली बहादूर याने बुंदेलखंड जिंकून राज्य स्थापन केल्यानंतर नाना फडणवीसांनी या दरवाजाला अली बहादूर दरवाजा असे नाव दिले.

१८३० च्या वेळीचा पुण्यातील समाजाची मानसिकता व धार्मिक बंदिस्तपणा लक्षात घ्यायला हवी . मस्तानीला ब्राह्मण वर्गाचा सामाजिक,धार्मिक कारणांसाठी विरोध होता.मुघलांच्यात आणि मराठ्यांच्यात बहुपत्नीत्व मान्य होते , पण ब्राह्मणांमध्ये नव्हते .( दोन ब्राह्मणांकडे बहुपत्नीत्व होते , उदाहरण म्हणजे नाना फडणवीसला ९ बायका होत्या , हे झालं कोकणस्थ , तसच देशस्थही , भगवंत रामचंद्र अमात्य याला दोघी बायका होत्या व पहिली व्यंकुबाई ही तर निळोपंत पिंगळ्यांची कन्या)

त्या मुलळे त्या काळी पहिले बाजीराव यांनी दुसरी बायको ती हि पर धर्माची हे सहन होणे अवघडचे होते .शनिवारवाड्यात कधीच स्थान न मिळालेल्या मस्तानीला बाजीरावाने पुण्याच्या कोथरुड भागात एक वाडा बांधून दिला होता. तिथे ती राहायची.

बाजीरावांबरोबर बायको म्हणून राहू लागल्यामुळे पेशव्यांच्या घरात तिच्याविरुद्ध भांडण सुरू झाला.पेशवा हे स्वराज्याचे मुख्ये प्रधान असल्यामुळे त्यांचा घरातील वाद हा घर पुरता मर्यादित न राहता या संपूर्ण प्रकरणाला सार्वजनिक रूप प्राप्त झाले होते.ब्राह्मण वर्गाने पेशवा परिवारावर बहिष्कृत टाकायची भाषा सुरु केली.पुण्यातील ब्राम्हणांनी बहिष्कार चालू ठेवला तर पेशवे काशी हून ब्राह्मण घेऊन येतील व सर्व धार्मिक कार्ये चालवतील असे राधाबाईंनी ब्राह्मणांना सांगितलेब्राह्मणांनी बहिष्कार टाकायची भाषा केली तरी तसे केल्याचे दिसत नाही.(की हे लग्न आपल्या वैदिक शास्त्राने नव्हते झाले , मुळात लग्नच नव्हते ते , मस्तानी उपस्त्री होती असेच सर्व इतिहासकार सांगतात)

उदाहरण

१) बाजीरावांचा मुलगा राघोबादादा याची मुंज ४ फेब्रुवारी १७४०

२)धाकटा मुलगा जनार्दन याची मुंज २६ मार्च १७४० ला

३)सदाशिवरावभाऊ याची मुंज २६ फेब्रुवारी १७३६ ला व पहिले लग्न ७ फेब्रुवारी १७४० ला ही सर्व कार्ये पार पडली नसती.

आणखी एक कारण

थोरले बाजीराव व मस्तानी यांच्या लग्नामुळे मुळे पेशवा कुटुंबात उठलेल्या वादळामुळे मोठे धार्मिक संकट उभे राहिले.या प्रकरणातील राधाबाई व चिमाजीआपांच्या धोरणामुळे त्यांना खलनायक मानले गेले .बाजीराव मस्तानीच्या आहारी गेल्यास राज्याचे नुकसान होईल व मस्तानीचा पुत्र समशेर बहाद्दर पुढच्या काळात राज्यासाठी हटून बसला तर राज्याचे विभागणी होईल , कारण त्यावेळी शाहू महाराज - ताराबाई यांची वाद समोर होताच मस्तानी पेशव्यांची आई राधाबाई, भाऊ चिमाजी अप्पा आणि चिरंजीव नानासाहेब या तिघांचा मस्तानीने बाजीरावाबरोबर राहण्यास विरोध होता. बाजीरावाने तिचा नाद सोडून द्यावा म्हणून चिमाजी अप्पा व आई राधाबाई यांनी फार प्रयत्न केले. पण बाजीरावाने त्या गोष्टीस सरळ नकार दिला. डिसेंबर 1739 मध्ये तर आपल्याबरोबर ही मंडळी मस्तानीस स्वारीस पाठवित नाहीत याचा राग येऊन वैतागून बाजीराव नासिरजंगावरील स्वारीवर गेले. ते स्वारीवर असतानाच पेशव्यांच्या घरी पुण्यास मुलांच्या मुंजी झाल्या. डिसेंबर 1739 ते 1740 मार्च पर्यंत या स्वारीची कामगिरी त्यांनी व्यथित हृदयाने पूर्ण नेली.

पुढचे संकट टाळण्यासाठी बाजीराव-मस्तानीला एकमेकांपासून लांब केले पाहिजे,हा चिमाजीआप्पा व राधाबाईंचा आग्रह होता.मस्तानी चे शत्रू अशी राधाबाईंची आणि चिमाजी यांची प्रतिमा समाजात झालेली आहे.पण त्यांनी व्यक्तिगत मस्तानीचा कधीही द्वेष केल्याचे सापडत नाही.

मस्तानीला समशेर बहाद्दर नावाचा पुत्र १७३४ सुरुवातीला झाला.बाजिराव व चिमाजीआप्पा युद्धासाठी पुण्याबाहेर होते.त्यावेळी मोठी सून काशीबाई यांनी मस्तानीच्या बाळंतपणाची सर्व काळजी घेतली होती.

'पुण्यातील पेशवेकालीन रास्तेवाड्यात समशेरबहाद्दरचा जन्म झाला.मस्तानीच्या बाळंतपणापूर्वी काही आठवडे राधाबाई,काशीबाई व मस्तानी त्या वाड्यात राहत असत.याबद्दल हेतुपूर्वक गुप्तता बाळगण्यात आली होती..पण पेशवा परिवाराचा राजकीय व कौटुंबिक कारणांसाठी विरोध होता.'राज्याहिताचे रक्षण' हे त्यामागचे कारण असू शकते

या संदर्भात वाद टोकाला गेल्यावर राधाबाई चिमाजी आप्पांना लिहितात:'

चिरंजीव राजमान्य राजश्री आपा यांप्रती राधाबाई आसीर्वाद उपरी.येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लिहित असिले पाहिजे.विशेष,चिरंजीव राजश्री राव याजपासी बहुत युक्तीच्या विचारे जो विचार करणे तो करून देणे.चालीवरी नजर देऊन जे कर्तव्य ते करावे.बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद'

बाजीराव स्वारीवर आहे याचा फायदा घेऊन या काळात मस्तानीला पुण्यात कैदेत ठेवण्यात आले. एवढेच नव्हे, तर बाजीरावापासून मस्तानीस दूर करण्याची परवानगी शाहू महाराजांकडून मिळविण्याचा प्रयत्नही पेशवे कुटुंबियांनी केला. परंतु शाहू महाराजांनीही त्यांना सल्ला दिला. मस्तानीस कैदेत ठेवून बाजीरावास दुखवू नये असे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले

, ""राऊ यास खट्टे न करावे. त्यांचे समाधान राखावे. तिला अटकाव करून सल्ला तोडू नये.

बाजीरावांच्या मरणाची बातमी तिला समजताच तिनेही मृत्यू स्वीकारला तिचा मृत्यू विष प्राशन करून झाला की मुद्दाम प्राणघात करून घेतला हे समजण्यास मार्ग नाही. शनिवारवाड्यात मृत्यू झाल्यावर तिला तिच्या इनामाचे गाव पाबळ येथे नेऊनअंत्यसंस्कार करण्यात आले.

Edit कांसातील दोन्ही माजीती शुभम सरनाईक यांनी दिल्या आहेत

 लेखकाकडे 775 उत्तरे आहेत व 1 कोटी वेळा उत्तरे पाहिली गेली आहेत4 वर्षे

जेंव्हा महाराजांना विठ्ठलदासच्या हवेलीमध्ये हलवण्यात आले तेंव्हाच राजांना कळून चुकले की आता थोडेच दिवस शिल्लक आहे, त्या आधी आपल्या जवळची फौज राजांनी कमी केली होती.यापुढे काय झाले याचे मुघल,राजस्थान,मराठ्यांंच्या पत्रांंमध्ये उल्लेख आहे, त्यामुळे पुढे मोठा गोंधळ झाला आलमगीरनामा मध्ये असे लिहिले की राजांनी 19 ऑगस्ट 1666 ला सुटका केली तर राजस्थान दस्तावेज सांगतो 18 ऑगस्ट, शिवभारत मध्ये 17 ऑगस्ट तारीख नमूद केले आहे.मदारी मेहतर ची कथा जोडली आहे कारण पुढे इतिहासात मदारी मेहतर च काय झाले ते इतिहासात दिसत नाही.शिवाजी महाराजांच्या भोवती रामसिंह(मिर्झाराजा जयसिंह चा मुलगा) च्या फौजा होत्या ज्या राज्यांचे रक्षण पण करायच्या.राजांनी रामसिंहला वचन दिले होते की ते दगा फटका करून पळून जाणार नाही.त्यामुळे राजे आता रामसिंहच्या वचनाचे काय करायचे त्या विवंचनेत होते.पण नंतर फौलादखानने घातलेल्या त्या वेढ्यानी त्यांनी रामसिंहच्या वचनातुन मुक्त झाले. शिवाजी महाराज पेटाऱ्यामधून गेले की पेटारा उचलणाऱ्या माणसांचा पोशाख घालून पसार झाले ते नक्की कोणालाच माहिती नाही. शिवाजी महाराजांचा सुटकेचा मार्ग कोणता यात सुद्धा एकमत नाही. शिवाजी महाराजांची सुटका झाली याचा उल्लेख मुघली दरबाराने ठिकठिकाणच्या चौक्या ,गड याना पाठवलेल्या पत्रामधून दिसतो ते पत्र आहे 03 सप्टेंबर चे.मुघली दस्तावेज नुसार शिवाजी महाराज 12सप्टेंबर ला राजगडला पोचले याचा दाखल देतात, पण राजा जयसिंह ने पाठवलेल्या पत्रामध्ये राजे 27 सप्टेंबर पर्यंत राजगडावर पोहचले नव्हते.पण जेधे शकावली नुसार राजे 20 नोव्हेंबर ला राजगडावर पोहचले.यात जेधे शकावली ची तारीख योग्य वाटते.जिजाबाईंनी महाराज राजगडावर पोहचले अशी आवई उठवलेली असण्याची शक्यता आहे त्यामुळे मुघल चौक्या निर्धास्त होऊन राजांचा मार्ग सुकर झाला असेल.त्याला राजा जयसिंग बळी पडले नाहीत ,त्यांनी शिवाजी राजे पोचले नाहीत याची बातमी औरंगझेबला दिली असावी.मुघलांनी महाराजांना शोधण्याची पराकाष्ठा केली. पण महाराजांनी आधीच सर्व गोष्टी नियोजन केले असेल.शिवाजी महाराजांनी आग्रा ला सुटका करून घेतल्यावर सर्वात सोपा दक्षिणेचा मार्ग निवडाल नाही कारण त्यावर सर्वात जास्त चौकशी चालू असेल.त्यांनी थेट उत्तरेला जाऊन संभाजी महाराजांना मोरोपंत पिंगळेच्या मेहुण्यांकडे संभाजी महाराजांना मथुरेमध्ये सुखरूप ठेवून नंतर यमुना पार केली आणि तिथून प्रयाग,काशी, गया अशी तिर्थस्थळे जाऊन नंतर अंबिकापूर,अमरकंटक,रत्नपुर,विलासपूर ,रायपूर ,बस्तर अश्या कामी मुघल चौक्या आणि थोड्या कमी मनुष्य वस्तीच्या प्रदेशातून गोंडवन आणि नंतर गोवळकोंडा तिथून पुन्हा उत्तरेकडे प्रयाण केले, सोलापूर पंढरपूर मार्गे राजगडाला आले असावेत.तसा उल्लेख मराठा कागदपत्रांमध्ये आहे आणि भीमसेन सक्सेना याच्या कागदपत्र मध्ये आहे.आणि इतिहासकारांच्या मते हाच मार्ग सुरक्षित आहे.महाराजांच्या सुटकेचा सर्वात फटका बसला तो नेताजी पालकर याना.त्यांना औरंगजेब ने पकडून मुस्लिम धर्मात घेतले आणि मोहम्मद कुली खान बनवले आणि पाश्तून प्रांतात जिथे इराणी फौज डोईजड होत्या तिकडे पाठवले.(भीमसेन सक्सेना हा एक छोटा मुघल सरदार होता शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर औरंगझेब 1682 ला त्याबरोबर आला होता पण याच्या वर्णनामध्ये मुघलांची तारीफच जास्त आहे) त्यावेळचे वर्णन लिहायची सवय होती, मराठा सरदार च्या तावडित सापडला आणि त्याने सुटका केली स्वतःची.शिवाजी महाराजांच्याया सुटकेचा सर्वात जास्त श्रेय गुप्तहेर खात्यालाच (बहिर्जी नाईक)द्यावे लागेल,हिरोजी फर्जं, रघुनाथराव कोरडे, मोरोपंत पिंगळे व्याही विश्वासराव अन त्यांच्या पत्नी याना द्यावे लागेल. संभाजी महाराज वाटेतच मृत्यूमुखी पडल्याची राजांनी राजगडावर कबुली दिली, श्राद्ध घातले, यामुळे मुघल बऱ्यापैकी निर्धास्त झाले,सर्व प्रकार शांत झाल्यावर संभाजी महाराज परतले.

 

काळाच्या पडद्याआड गेलेली राजघराणी म्हणजे मी इथे असे गृहीत धरतो की ज्यांचे वंशज आजमितीला अज्ञात आहेत

  • मौर्य
  • शुंग
  • काण्व
  • सातवाहन
  • वाकाटक
  • गुप्त
  • वर्धन
  • कर्कोट
  • उत्पल
  • लोहर
  • शाही
  • चच
  • पल्लव
  • चोळ
  • संगम
  • साळूव
  • तुळूव

उपरोक्त लोकांपैकी काहींचे वंशज म्हणविणारे हल्ली पुढे येतात पण आपण वंशज असल्याचे सिद्ध करू शकत नसल्याने कुठल्याही प्रामाणिक, वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासकाच्या दृष्टीने ते लोक अग्राह्य ठरतात आणि म्हणून त्या वंशाचे नाव या यादीत दिसते.

 


मराठी माणसाला अनेक कारणांमुळे साधेपणाची आवड आहे. तेच त्याच्या खाण्यापिण्यातही दिसते. शिवाय बडेजाव मिरवण्याची हौस कमी. स्वभावातही तसा रुक्षपणा.

गुजरात, मध्यभारतापासून उत्तरेला सर्वत्र मिठायांचे किती प्रकार बनतात. पण आपण घाटावर पुरणपोळी व कोकणात खाजे हयापलीकडे जात नाही.

वि. द. घाटे ह्यांनी एका ठिकाणी लिहिले होते. मराठी माणसे मांस खातात. पण एकाच प्रकारे बनवितात. मुसलमानांच्या सहवासात येऊनही त्यांच्याप्रमाणे विविध चवीची मांसान्ने बनविण्याची कला शिकून घेतली नाही.

खाणेच अगदी साधे तर नोंदी काय करणार ! शिवाय नोंदी करण्याची आवडही फारशी नाही.

मोठमोठे पराक्रम केले, त्याच्या नाही नोंदी केल्या; तर काय खाल्ले त्याच्या कुठल्या नोंदी !

 

दुर्ग महर्षी मांडे सर सांगायचे, शिवाजी महाराज अभ्यासायच्या आधी औरंगजेब अभ्यासा. जोपर्यंत तुम्हाला औरंगजेब कळणार नाही तोपर्यंत शिवाजी महाराज कळणार नाहीत. शत्रू किती पराक्रमी आणि किती चतुर होता हे कळले तर च त्याला सोबत लढलेला आपल्या राजाच्या पराक्रमाची महती कळेल.

सिव सरजा के बैर को यह फल आलमगीर लुटे तेरे गड सभी कुटे गये वजीर~ कविराज भूषण (हे आलमगीर (औरंगझेब) तुला शिवाजी महाराजांशी वैर करून काय लाभले? तुझे सर्व गड गेले आणि वजीर मारले गेले. )

जदुनाथ सरकार यांनी औरंगझेब विषयी अनेक पुस्तके लिहलेले आहे . मराठी पुस्तके ही शिवाजी महाराज आणि औरंगझेब हेच संबंध धरून लिहलेले आहे, औरंगझेब इतर बाब थोडी दुर्लक्ष केली आहे.

मुळात औरंगझेब शिवाजी महाराज मृत्यूनंतर तरी १६८१ ल तरी महाराष्ट्रात का आला ?

  • अकबर

त्याचा लाडका शहजादा अकबर , अकबर ने राजपूत बरोबर राहून बंडाळी केली . औरंगझेब ने घात पताने त्याचा पराभव केला . अकबर पळून आला संभाजी महाराज कडे . आणि औरंगझेब पुढे अकबर च पाठलाग करत महाराष्ट्रात आला.कोणी म्हणते औरंगझेब ला निमित्त मिळाले.पांनलक्षात ठेवा हा शहजादा परत कधीच बापाकडे गेला नाही तर थेट वेंगुर्ल्यात तून इराण ला निघून गेला आणि इराण मध्ये १७०२ मध्ये मृत्यू झाला.

  • बुऱ्हाणपूर चढाई

छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यभिषेक केला आणि १५ दिवसात मुघलांचे नाक म्हणून ओळखलेले बुऱ्हाणपूर लुटले. शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत लुटले पण बुऱ्हाणपूर लुटले नव्हते. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटले आणि अनेक मशिदी पडल्या. बुऱ्हाणपूर हुन अनेक मौलवी औरंगझेबाच्या कडे गाऱ्हाणे पाठवले आणि बदल्याची मागणी केली.

  • अनेक शत्रू

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुघल हे एकमेव शत्रू नव्हते तरी आणखी खुप शत्रू होते (तिन्ही शाही, अंतर्गत बंडाळी, पोर्तुगिज, सिद्दी, इंग्रज, डच) तसेच औरंगझेब ला मराठा हे एकमेव शत्रू नव्हते तर आणखी खूप शत्रू होते . इराणचा शाह, सतनामी, शीख, जाट, राजपूत बंडाळी, आसामचे अहोम, आदिलशाही, कुतुबशाही , अफगाणिस्तानचे पाठानांचे बंड, . शिवाजी महाराजांनी मुत्सद्दी प्रमाणे मुघलांशी वागणूक केली . नंतर आदिलशाही आणि कुतुबशाही जुळवून घेतले.

  • शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी .

शहाजीहाराज ना जेंव्हा आदिलशाही ने कैद केले होते तेंव्हा शिवाजी महाराजांना अप्रत्यक्ष मदत केली तो औरंगझेबा ने. कैद केल्यावर शिवाजी महाराजांनी मी तुमची सेवेत दाखल होत आहे अस पत्र धाडले. औरंगझेब ने खुशीने स्वीकार केला आणि आदिलशाही ल उलट पत्र धडून शहाजी महाराज यांना सोडण्यासाठी दबाव बनवला. महाजन ना माहित होते ही सर्व मुस्लिम शाही आपले कट्टर दुश्मन आहे . पण त्यांनी कधीही तिन्ही शाहिना एकदम कधी दुखावले नाही. Systemic पद्धतीने आदिलशाही संपवली. दक्षिण विजय मध्ये कुतुबशाही मदत घेऊन अर्धा भारत घेतला आणि कुतुबशाही ल सोडून दिले.संभाजी महाराजांनी नंतर सुद्धा आदिल शाही आणि कुतुब शाही ल मदतच केली. १६५७ल अफजल खान ल मारले आणि औरंगझेब च कपाळावर आठ्या उमटल्या असतील. नंतर त्याच वेळी औरंगझेब ने शाहिस्तेखानाला पाठवले. त्यानंतर त्याचा सर्वात पराक्रमी सरदार मिर्झा राजे जयसिंह. मिर्झाने शिवाजी महाराजांना नामावले. पुरंदर च तह झाला. शिवाजी महाराज आग्राला ला गेले, तिथून त्यांनी सुटका केली आणि १६६७ल त्यांनी संभाजी महाराज तर्फे मनसबी पत्करली. संभाजी महाराज पांच हजारी झले. अक्षरश हा संघर्ष आणखी 4 वर्ष महाराजांनी मुत्सद्देगिरी ने दाबला. पण नंतर १६७१मध्ये सुरत , जालना लुटली . जसवंतसिंह सारखा दिलेरखान सारखे अनेक सरदार निरुपयोगी ठरले. त्याचवेळी औरंगझेब इतरत्र गुंतला होता. १६७४मध्ये महाराजांनी राज्यभिषेक केला आणि औरंगझेब जागा झाला पण नंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण विजय केला . तोंपर्यंत औरंगझेब आदिलशाही आणि कुतुबशाही ल सतत पत्रे लिहून शिवाजी महाराज ना संपवा आणि मुस्लिम धर्माची काळजी दर्शवत होता पणं कुतुबशाही आणि आदिलशाही ल माहित होते की आज ना उद्या औरंगझेब आपल्या ल पण संपवणार . त्यामुळे धर्म युद्ध हे बहाणा होता राज्य विस्तार हाच औरंगझेब च ध्येय होतं . मुत्सद्दी पणाच्या बाबतीत शिवाजी महाराज संभाजी महाराज उजवे असावत अस मला वाटते. एकदा औरंगझेब ने काही संदेश घेऊन संभाजी महाराजा कडे दुत पाठवला त्यावेळी संभाजी महाराज त्या संदेश वर थुकले असा एका पुस्तकात वाचलेले.

  • गरीब स्वराज्य

मुळात महाराष्ट्र त्याकाळी सधन आजिबात नव्हता . मुंबई ऐकस्तीत नव्हती . इकडे येणारे उत्पन्न पूर्ण देशात सर्वात कमी होते . गंगा नदी, बंगाल, माळवा, गुजरात सारखे सधन प्रदेश होते . त्यामुळे साहजिक दुर्लक्ष झाले.

  • औरंगझेबाच्या स्वराज्य अनुभव

औरंगझेब हा दोनदा दख्खन सुभेदार होता त्यामुळे औरंगाबाद ला असल्यामुळे त्याला इथली खडा खडा माहिती होती. इथे खडतर भागात युद्ध जिंकणे सहज शक्य नाही हे त्याला माहीत होते.

  • शिवाजी महाराजांचा मृत्यू

३ मे १६८० ला शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि वारसा मुळे मराठ्यांच्या धामधुमीचा काळ होता. त्यामुळे विजय सोपा राहील असे औरंगझेब ला वाटले .

औरंगझेबाच्या धार्मिक कट्टरतेने त्याच्या राज्याला, त्याच्या प्रजेपासून, ज्यात त्याचे सैनिकही होते, दूर नेले. औरंगझेबाच्या धार्मिक निष्ठा या त्याच्या राजकीय निष्ठांपेक्षा बलवत्तर ठरल्या आणि मोगल साम्राज्य ज्या आधारावर तोलले होते तो आधारच खचला.दक्खन काबीज करण्याचा त्याचा हट्ट अविवेकी होता. वाऱ्यावर स्वार झालेल्या आणि स्वतःच्या मनातील स्वराज्याच्या निष्ठेशिवाय इतर कोणतेही नैतृत्व न जुमानणाऱ्या मराठ्यांशी, औरंगझेब एक न संपणारे युद्ध लढत राहिला.

संदर्भ

1.Fall of the Mughal EmpireBook by Jadunath Sarkar

2. History of Aurangzib - Wikipedia

book

3. Image by instagram

 

अफझलखान अतिशय निर्दयी, क्रूर आणि कपटी सरदार होता. हा मुळचा अब्दुल्लाखान.एका भटारीण बाईचा मुलगा.पण आपल्या अंगभुत गुणाने आणि पराक्रमाने तो मोठा झालेला होता. अफझलखान हि त्याला विजापुर दरबाराने दिलेली पदवी होती. स्वभावाने अत्यंत क्रुर असा हा ईसम.कपट आणि दगाबाजी हि त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच होती. ज्या शहाजी राजांच्या खांद्याला खांदा लावून बसवपट्टणची लढाई जिंकली त्या शहाजी राजांना जिंजीच्या वेढ्यात कैद करताना त्याचे हात जराही थरथरले नाहीत. खानाच्या कपटी स्वभावाची आणखी दोन उदाहरणे सांगता येतील.
1) रणदुल्ला खान अन कस्तुरीरंगन राजाचे तुंबळ युद्ध सुरू होते. दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले होते अन शेवटी त्यांच्यात तह करायचा ठरला. रणदुल्ला खानाकडून अफजलखान तहाला बसला. अन कपटाने खानाने कस्तुरीरंगनचे मुंडके तलवारीने उडवले 2) शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूची-संभाजीची कपट करून त्यानेच हत्या घडवून आणली.

अफझलखानाने स्वतासाठी शहाबाग,विजापूर इथे कबर बनवून घेतली पण तो तेथे दफन होऊ शकला नाही !

१० नोव्हेंबर १६५९ दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचा संकल्प ठरला.

शिवाजी राजे तंबूमध्ये गेल्यावर तत्कालीन रिवाजानुसार खानाने आपल्या जवळ असलेली तलवार सोबतच्या हुद्देदाराच्या हाती दिली व त्यास दूर जाण्याचा इशारा केला. इकडे शिवाजी महाराजांनी देखील आपली तलवार आपल्या हुद्देदाराकडे सोपवली. शिवाजी आणि दोघेही एकमेकांच्या जवळ आले.दोघांनी तीनदा एकमेकांना डाव्या उजव्या बाजूला आलिंगन दिले. तिसऱ्या वेळी आलिंगन देताना अचानक खानाने राजांना ओढलं व राजांचा तोल गेला. खानाने राजांची मान डाव्या बगलेत दाबली व आदिलशहाने दिलेल्या रत्नजडित कट्यारीने राजांवरती वार केला. त्या वारामुळे राजांचा अंगरखा फाटला अन कट्यार चिलखताला घासल्याने खर्रर्रर्रर्र खर्रर्रर्रर्र असा कर्कश आवाज झाला. चिलखत असल्यामुळे राजे बचावले, खान दुसरा वार करणार त्याआधी राजांनी आपली मान खानाच्या बगलेतून सोडवली. खानाने राजांवर दुसरा वार केला तो डोक्यावर. तो वार जिरेटोप फाडून आतील लोखंडाची पट्टी चिरून आत गेला आणि याक्षणी अफझलपेक्षा शिवाजी राजे अधिक सावध आणि चपळ असल्यामुळे त्यांनी आपल्या उजव्या हाताच्या अस्तनीमध्ये लपवलेला बिचवा बाहेर काढून सरळ खानाच्या पोटात खुपसला. शिवाजी राजांचे हे कृत्य अफझलखानास अनपेक्षित असे होते. आश्चर्याचा धक्का आणि प्राणघातक असा हल्ला यांमुळे त्याला शिवाजी राजांवर शस्त्र उगारण्याचे भान राहिले नाही किंवा त्याला तशी संधीही प्राप्त झाली नाही. खानावर एक किंवा दोन घाव घालून शिवाजी महाराज मागे सरकले. दरम्यान बिचव्याचा पहिला वार होताच खान किंचाळला “ दगा दगा, खून खून.” खानाच पोट फाटलं. रक्ताचा धबधबा कोसळू लागला.

शिवाजीमहाराजांनी अफजलखानाच्या मृत्यूनंतर खानाच्या शवांचे अंत्यसंस्कार इस्लामी पध्दतीने करून त्याची कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभलीची व्यवस्था केली. कारण आहे शिवाजी महाराजांची साहिष्णुवृत्ती.

 

मिर्झाराजे जयसिंग यांच्या सोबत झालेल्या पुरंदर तहाच्या परिणामस्वरूप महाराजांना आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घ्यावी लागली होती.

मिठाईच्या पेटाऱ्यात बसून किंवा मिठाईच्या पेटीचे भोई बनून आणि हिरोजी फर्जंद यांना स्वतःच्या बिछान्यावर झोपवून महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून यशस्वी सुटका करून घेतली.

चित्र:विकिपीडियावरून

शिवाजी महाराज आणि स्वतः दोघेही हिंदू ह्या नात्याने जयसिंगराजे यांनी त्यांचा औरंगजेबाच्या सेवेत असलेला मुलगा रामसिंग यास महाराजांची सर्वतोपरी काळजी घेण्यास सांगितले. शिवाजीसारखा एक हिंदू राजा प्रस्थापित मुघलांच्या विरोधात दक्षिणेत स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी धडपडतोय ही गोष्ट औरंगजेबाचा 'मांडलिक' असलेल्या जयसिंगाला अप्रूप वाटली.

ऑगस्ट 1666 मध्ये महाराजांनी मुलगा संभाजीसोबत धाडसी पलायन केले.औरंगजेब प्रचंड संतापला,चारी दिशांना त्याने महाराजांचा शोध घेतला परंतु त्याचे सारे प्रयत्न व्यर्थ गेले.

औरंगजेबाने रामसिंगला यासाठी जबाबदार धरले. रामसिंगचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले,संपत्ती जप्त करण्यात आली,दरबारातून हद्दपार करण्यात आले आणि आसामपासून खूप दूर असलेल्या सराईघाट येथे रामसिंगाला लढावयास पाठविले गेले.

शिवाजीराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून शिताफीने सुटका करून घेतली हे ऐकून मिर्झाराजेंना आनंदच झाला असेल पण यामुळे ते औरंगजेबाच्या निशाण्यावर आले.मिर्झाराजेंची चूक हीच की त्यांनी शिवाजीराजांची नको तितकी 'काळजी' घेण्याचा सल्ला पुत्र रामसिंगास दिला.

मिर्झाराजेही औरंगजेबाच्या शिक्षेतून सुटले नाहीत. आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात.. 'अक्षरशः चारही मार्गानी मला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न औरंगजेबाकडून करण्यात आला.पहिल्यांदा माझा मुजऱ्याचा सन्मान काढून घेण्यात आला. माझ्या अधिकारकक्षेतील महत्वाचे जिल्हे ताब्यात घेण्यात आले.मी जे काही या युद्धात पणात लावले होते ते सगळे तर गेलेच याहीपेक्षा दुःखाची बाब म्हणजे माझा मुलगा रामसिंग यांच्या सर्व अधिकारांचा नाश करण्यात आला.'

28 ऑगस्ट 1667मध्ये मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे मिर्झाराजे जयसिंग यांचा अतिशय हलाखीच्या अवस्थेत मृत्यू झाला.असे म्हटले जाते की औरंगजेबानेच त्यांच्यावर विषप्रयोग केला. मिर्झाराजेंच्या पुढील दोन पिढ्या या अपयशाच्या गर्तेत सापडल्या.

मिर्झाराजेंच्या मृत्यूनंतर बुऱ्हाणपुराच्या तापती नदीच्या तीरावर मिर्झाराजेंच्या सन्मानार्थ औरंगजेबाने छत्री उभारली. 'राजाची छत्री' या नावाने ती प्रसिद्ध आहे.

आधी क्रूरपणे हाल करायचे आणि नंतर सन्मान करायचा असा औरंगजेबाचा प्रघात होता.महाराज आग्र्याहून निसटून गेल्यामुळे औरंगजेबाची नाचक्की झाली,त्याचा दरारा कमी झाला आणि त्याचा त्रास मिर्झाराजे आणि रामसिंगला सोसावा लागला.

 

क्रमवारी लावा
·
फॉलो करा

तसा मी बऱ्याच वेळा रायगडावर गेलोय, पण ह्या वर्षीच्या राज्याभिषेकाला जेव्हा रायगडावर गेलो तेव्हाचा किस्सा सांगतो.

माझे गुरुवर्य व जुने गिऱ्हारोहक रमेश सावंत (वय ६७, ) ह्याच्यासोबत रायगड फिरत असताना त्यांचेच एक सहकारी (यांचे आणि निनाद बेडेकरांचे जवळचे सख्य होते) आमच्या सोबत होते. तेव्हा हाच प्रश्न एका तरुणाने विचारला, की काका महाराजांच्या सिंहासनच काय झालं? तर ते काका अगदी ठामपणे बोलत होते की सिंहासन इथे रायगडातच आहे. मला ऐकूण थोडं आश्चर्य वाटलं, पण त्यांनी पुढे जे सांगितलं ते ऐकुन विश्वास बसला की असंही होऊ शकत. ते म्हणाले जेव्हा किल्ल्याला शत्रूचा वेढा पडायचा तेव्हा गड काही एक दोन दिवसात पडायचा नाही, महिनोन्महिने, वर्षानुवर्षे वेढा असायचा(रामशेज ला ६ वर्ष वेढा होता) आता मला सांगा की रायगडाला जेव्हा वेढा पडला असेल आणि किल्ला आता शत्रूच्या ताब्यात द्यावा लागेल हे मावळ्यांच्या लक्षात आलं असेल तेव्हा मावळ्यांनी, सैनिकांनी किल्ल्यावरील संपत्ती, सिंहासन वाचवण्यासाठी, लपवण्यासाठी प्रयत्न केले नसतील का ? एखादा मोठा खड्डा खोदून सिंहासन त्यात गाडून त्यावर एखादं बांधकाम केलं नसेल कशावरून ? रायगडाच्या पोटात असलेल्या सगळ्या गुहांचा , घळींचा अजून पूर्ण शोध लागलेला नाही, त्यात सिंहासन नसेल कशावरून ? गंगासागरात कशावरून टाकलं नसेल ? मनोऱ्याखाली नसेल कशावरून ? बाजारपेठेच्या एखाद्या दुकानाखाली नसेल कशावरून ? ह्या काकांच्या उत्तराने माझ्याही डोक्यात जरा चक्र फिरायला लागली.

 

जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांनि स्वराज्यासाठी बलिदान दिले तेव्हा जुल्फिकार खानणे रायगडाला वेढा दिला तेव्हा महाराणी येसूबाई यांनी स्वराज्य वाचावे म्हणून हा किल्ला 3नोवेम्बर जुल्फिकार खानच्या ताब्यात दिला .

आख्या हिंदुस्थानात मोघलाना पुरून उरणारे एकाच तक्त रायगडावर होते हे याचा राग मुघलांना होताच त्याचबरोबर त्या सिहासनाचा द्वेष ही मुघल करत होते , जेव्हा मुघल रायगडात घुसले त्यांनी पहिले ते सिहासन घनाचे घाव घालून तोडले तरीही ते सिहसान तुटत नव्हते हे पाहून मुघलाणी त्याला आग लावली आणि ते सिहासन वितळवले .

आज जर तुम्ही रायगडावर तुम्ही गेलात तर आज जिथे महाराजांचे सिहासन आहे त्याच्या पाठीमागे एक मोठा दगड आहे ह्याच त्या दगडावर ते सिहासन वितळल्यामुळे त्याचे लोळ त्या दगडावर पडून तो दगड काळा झाला आहे असे म्हणतात .

शिवाजी महाराजांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन नक्की मोघलांनीच जाळले होते का? की ते येसूबाईंनी सुरक्षित ठेवले?

मित्रांनो आपल्यापैकी खूप जणांना हेच माहीत असेल की, छ्त्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले ३२ मण सोन्याचे सुवर्ण सिंहासन रायगडचा पाडाव झाल्यानंतर मोगलांनी वितळवून टाकले.आणि सर्व खजिना त्यांच्यासोबत घेऊन गेले.

नाही…!

सिंहासनाचा इतिहास जेव्हा राजमुद्रा चॅनलने जाणून घेतला तेव्हा आम्हाला लक्षात आले की, शिवसिंहासनाचा इतिहास आपण समजतो तसा नाहीये.स्वराज्यात सर्वात मौल्यवान असलेले हे सिंहासन मराठे इतके सहजपणे मोगलांच्या ताब्यात कसे देतील?

तर जाणून घेऊयात नेमके इतिहास याबद्दल काय सांगतो ते.
नोंद क्र. १– ६ जून १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा या ३२ मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावर आपले राजे आरूढ झाले.

नोंद क्र.२– २५ मार्च १६८९ ते ३ नोव्हेंबर १६८९ रोजी झुल्फिकारखान उर्फ इतिकादखान याने रायगडला वेढा दिला होता.

नोंद क्र.०३ ३ नोव्हेंबर १६८९ ते १७०७-०८ पर्यंत रायगडावर मोगलांचे राज्य होते.औरंगजेबाने रायगडचे नाव इस्लामगड ठेवले होते. आपण जो सिंहासन जाळून फोडले असे म्हणतो ते या कालावधीत घडले असेल असे मानुयात.


नोंद क्र.०४– १७०७ ते १७३३ पर्यंत रायगड जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात होता.

नोंद क्र.०५-१७३३ छ्त्रपती शाहूंनी रायगड जिंकून घेतला व तो स्वराज्यात आला.

नोंद क्र.०६ १७७३ ला रायगड पेशवेंच्या ताब्यात आला.आप्पाजी हरी यांच्या अधिपत्याखाली रायगड होता.इथे एक नोंद विचार करावयास लावते ती म्हणजे ‘ आप्पाजी हरिंनी सिंहासनास मुजरा केला व सिंहासनसमोर ०५ रुपये ठेवले.तसेच पेशवेंच्या कागदपत्रात देखील सिंहासनाच्या खर्चाचा उल्लेख वारंवार सापडतो.त्यांनी १७९७ पर्यंत सिंहासनासाठी लागणाऱ्या कापडाची नोंद केली आहे.

नोंद क्र.०७-१७९६-१७९७ मध्ये नाना फडणवीस प्रथम महाड येथे व नंतर रायगडावर आले.आणि त्यांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची व्यवस्था केली अशी नोंद मिळते.

नोंद क्र.८ सन १८१८ मध्ये रायगड इंग्रजांनीं जिंकला.

१६८९ रोजी महाराणी येसूबाई यांनी रायगड मोघलांच्या ताब्यात देण्यापूर्वी गडावरून दोन सश्रद्ध दैवते हलवली होती.प्रथम शिवाजी महाराजांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन व दुसरे जगदीश्वराचे शिवलिंग… जगदीश्वराच्या शिवलिंगास त्यांनी रायगडाच्या रहाळ्यात असलेल्या वारंगी गावात हलवले होते.असा उल्लेख आढळतो..सिंहासन नेमके कुठे ठेवले त्याची नोंद नाही.

वरील ७ नोंदीवरून हेच स्पष्ट होते की, ३२ मण सोन्याचे सुवर्ण सिंहासन रायगडावर होते.मोगलांच्या ताब्यात गेले नव्हते.त्याबद्दल अजून एक पुरावा म्हणजे शिवकाळात आणि पेशवेकाळात गडाची व्यवस्था ही ‘ शेडगे ‘ कुटुंबाच्या ताब्यात होती.

त्यांच्या पिढीजात एक लोककथा पुढे येते ती म्हणजे, इसवी सन १८१८ ला रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर गडावरील सर्व कुटुंबांना गडाखाली पोहचवण्याची जबाबदारी दोन नेक सरदारांनी स्वीकारलेली होती.त्यांचे नावे खंडोजी आणि यशवंता असे होते.

या दोन सरदारांनी सर्वांना गडाखाली पोहच केल्यावर आपले राहिलेले महत्त्वाचे काम गुपचूपपणे सुरू केले. त्यांनी गडाचे सर्व दरवाजे आत मधून बंद करून घेतले.आपल्या सोबतीला अजून ७ जण घेतली व अशे एकूण ९ जण राजसभेत आले.

सर्वांनी प्रथम ३२ मण सुवर्ण सिंहासनास शेवटचा मुजरा केला. व सर्वांनी शिव सिंहासन उचलून लाकडी तराफ्यावर ठेवले. पुढे ४ जण व मागे ५ जण असे धरून मेणा दरवाजा पर्यंत आणले.आणि मजबूत दोरखंडाच्या साहाय्याने ९ पैकी ७ सरदार काळकाई खडग्यातील वाघ जबड्यात उतरले.

त्या सर्वांनी त्याला तिथेच पुरून टाकले.आणि त्यांनी काम फत्ते केले.

दोरखंडाच्या सहाय्याने ते जेव्हा वर येत होते तेव्हा वर असलेल्या यशवंत व खंडोजी या दोन सरदारांनी त्या सात सरदारांचे एका मागुन एक परतीचे दोरखंड कापून टाकले. कारण फंद फितुरी करण्याचा धोका होता.

उद्या कोणीही त्या सोन्याच्या लालसे पोटी त्या ३२ मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनाची जागा दाखवली असती व ते लुटले असते.

खंडोजी व यशवंता ने पण तिथेच आपला जीव दिला. त्या ९ सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ३२ मण सुवर्ण सिंहासन शेवटचे पाहिले.

वरील सर्व संदर्भ नोंदीवरून आपण असे निष्कर्ष काढू शकतो की, सिंहासन हे अजूनपन रायगडवर एखाद्या अज्ञात जागेत असेल.शोध घेतला गेला पाहिजे.इतिहासलाच माहिती खरे काय?

मित्रांनो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचा इतिहास कसा वाटला ते कंमेंट करून नक्की कळवा!

https://rajmudraofficial.com/shivaji-maharaj-sinhasan-history/

 

·
फॉलो करा

रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाई । असे वर्णन ज्या सूर्यवंशाचे करतात त्या कुळात शिवछत्रपतींचा जन्म झाला होता.

श्री शिवछत्रपती

राजस्थानच्या मेवाडवर पिढ्यान पिढ्या राज्य करणाऱ्या सूर्यवंशीय गुहिलोत राजघराण्यातील सिसोदिया शाखेतील सज्जनसिंह नावाचा एक पुरुष दक्षिणेकडे महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाला आणि त्याच्याच वंशात पुढे भोसले, घोरपडे इत्यादि घराणी उद्भवली असे आपल्याला अनेकानेक ऐतिहासिक साहित्यांमधून कळते ज्यांपैकी काही पुढीलप्रमाणे

  • वेद :- वेदांमध्ये अनेक ऋचांचे द्रष्टे हारित आदिक सूर्यवंशीय राजर्षी आहेत ज्यांचा उल्लेख भोसले मंडळी आपल्या वंशवेलात आदराने करते.
  • वाल्मीकि रामायण :- यात भगवान श्रीमन्नारायण ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या मुलांपर्यंत आपल्याला वर्णन मिळते.
  • महाभारत :- सर्वज्ञ कृष्णद्वैपायन व्यास कृत महाभारतात आपल्याला अनेक सूर्यवंशी राजांचा वृत्तांत दिलेला आढळतो.
  • पुराणं :- सनातन धर्मातील अनेक वंशांच्या राजांच्या वंशावळी पुराणांमध्ये आहेत, मुळात राजवंशावली आणि त्यांचा विस्तार हे पुराणांच्या लक्षणांपैकी महत्वाचे एक लक्षण मानले जाते.
  • रघुवंशम् :- कविकुलगुरू कालिदास कृत या महाकाव्याचे नावच त्याचा विषय दर्शविण्यासाठी पर्याप्त आहे.

उपरोक्त ग्रंथ आज त्यातील चमत्कारिक वर्णनांमुळे ऐतिहासिक दृष्टीने शब्दशः ग्राह्य धरले जात नाहीत (पण तरीही प्रत्यक्ष भोसले वंशीय नृपतींना ते मान्य असल्याने येथे आवर्जून दिले आहेत.) मात्र पुढील स्रोत ऐतिहासिक दृष्ट्या बऱ्यापैकी प्रमाण मानले जातात.

  • मेवाडचे शिलालेख, ताम्रपट :- मेवाडच्या गुहिलोत राजांनी आपल्या धर्मपरायण वृत्तीने तथा अतुलनीय विक्रमाने भारतीय इतिहासात स्वतःचे ध्रुवासमान अढळ स्थान निर्माण केले आहे. पराक्रम किंवा दानधर्म केल्यावर शिलालेख किंवा ताम्रपट देण्याची पद्धत भारतात पुरातन असल्याने त्यास मेवाड अपवाद कसे राहणार? अशा लेखांमध्ये दाता, भिक्षुक, जित, जेत्यांप्रमाणे संबंधित लोकांची वंशावळही दिलेली असते. भोसले हे पूर्वीचे गुहिलोत असल्याने या लेखांचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते.
  • राधामाधवविलासचंपू :- महाराज शहाजीराजे भोसल्यांचे त्यांच्याच दरबारातील जयराम गंभीर पिंड्ये नामक कवीने रचलेले हे लघुचरित्र भोसले कुळाच्या वंश, गोत्राची विश्वसनीय माहिती देते.
  • शिवभारत :- चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम्। असे ज्याचे यथार्थ वर्णन केले जावे ते कवींद्र परमानंद गोविंद नेवासकराने शिवछत्रपतींच्या आदेशान्वये रचलेले त्यांचे चरित्र मालोजीराजांपासून पुढील वंशवृत्त जाणण्यासाठीचा प्रामाणिक स्रोत मानले जाते.
  • सभासद बखर :- जिंजीला असताना छत्रपती राजाराम महाराजांच्या आग्रहाने शिवछत्रपतींचे सभासद कृष्णाजी अनंत हिरेपारखी यांनी रचलेली ही ऐतिहासिक दृष्टीने सर्वात विश्वसनीय बखर असून यात शिवछत्रपतींच्या आधल्या ३ पिढ्यांचे उल्लेख आहेत.
  • शिवछत्रपतींची ९१ कलमी बखर :- उत्तरकालीन असली तरीही काही इतिहासकारांद्वारे बऱ्यापैकी विश्वासनीय मानल्या जाणाऱ्या या बखरीमध्ये शिवछत्रपतींच्या पूर्वीच्या काही पिढ्यांची माहिती मिळते.
  • शेडगावकर बखर :- उत्तरकालीन तथा अनेक विसंगतींनी युक्त असलेली ही बखर ऐतिहासिक दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण नसली तरीही यात भोसले घराण्याच्या काही पिढ्यांचे उल्लेख आहेत.
  • सप्तप्रकरणात्मक बखर :- सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या निर्देशानुसार त्यांचे पिढीजात लेखणिक मल्हार राम चित्रे यांनी लिहिलेली ही बखर शिवछत्रपतींच्या चरित्रावर आधारभूत असून त्यातही त्यांच्या पूर्वीच्या काही पिढ्यांचे उल्लेख आपल्याला बघायला मिळतात.
  • बृहदीश्वर शिलालेख :- दक्षिण भारतात तंजावर स्थित गृहदिश्वर महालयात एकोजीराजे भोसले यांचे वंशज द्वितीय सरफोजीराजे यांनी कोरवून घेतलेला हा शिलालेख कदाचित मराठी इतिहासातील सर्वात विशालकाय शिलालेख असावा. यात भोसले वंशाचे शेषशायी श्रीविष्णुंपासून ते विद्यमान भोसले राजांपर्यंतचे वर्णन दिलेले आढळते. साक्षात भोसले राजांनी स्वतः हा शिलालेख घडवून घेतल्यामुळे हा शिलालेख इतिहास अभ्यासाच्या तथा भोसल्यांच्या वंशवेलाच्या अभ्यासाकरिता अपरिहार्य आहे. हा शिलालेख कोरणाऱ्या कोरक्याने शिवभारताचा आधार घेतल्याचे निदर्शनास येते.
  • ऐतिहासिक पत्रे :- शहाजीराजे भोसल्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्या संदर्भात लिहिलेली अनेक पत्रे आज उपलब्ध असल्याने त्यातूनही त्यांच्या कार्याची माहिती कळायला हातभार लागतो.
  • सातारच्या सूर्यवंशी भोसले घराण्याची वंशावळ :- ख्रिस्ताब्द १८४० मध्ये सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपल्यास पुन्हा राज्यप्राप्ती व्हावी म्हणून आपल्या घराण्याची साद्यंत वंशावळ दिली होती जी पुढे प्राध्यापक महादेव गणेश डोंगरे यांनी प्रकाशित केलेली आहे. यास उदयपूरच्या तत्कालीन महाराणांचीही संमती होती.
  • भाट :- सहा महिने देशाटन करून वेगवेगळ्या लोकांचे वंशवेल गोळा करण्याचा पिढीजात व्यवसाय करणारे हे लोक पूर्वापार प्रसिद्ध आहेत. स्वतः शिवछत्रपतींनी देखील आपली वंशावळ यांच्याकडूनच राज्याभिषेकापूर्वी मागवून घेतली होती असे सप्तप्रकरणात्मक बखरीत सांगितलेले आहे. आज या लोकांकडे वंशावळींना राजस्थान राज्य शासनाची मान्यता देखील मिळालेली असून त्यांना सर्वोच्च न्यायालयात सुद्धा ग्राह्य धरली जाते.

(उत्तरात केवळ वडिलांकडील पूर्वजांचे उल्लेख आलेले आहेत, आईकडील पूर्वज हा स्वतंत्र विषय होऊ शकतो म्हणून इथे पाल्हाळ लावलेले नाही.)

तळटीपा

 

·
फॉलो करा

दादोजी कोंडदेव यांचा शिवछत्रपतिंंवर किती प्रभाव होता हे जाणून घेण्याकरिता सर्वप्रथम समकालीन आणि उत्तरकालीन महत्वपूर्ण ऐतिहासिक साधनं काय म्हणतात ते बघूया पण तत्पूर्वी दादोजी कोंडदेव कोण होते हेही जाणणे अनिवार्य आहे.

  • जेधे शकावलीत त्यांचा उल्लेख दादोजी कोंडदेव मलठणकर असा येतो ज्यानुसार ते पुण्याजवळील मलठण गावाचे होते असे कळते.
  • ९१ कलमी बखरीतील २० व्या कलमात म्हटले आहे "दादाजी कोंडदेऊ कुलकर्णी मौजे मलटण ता। पाटस पा। पुणे.…" (राजवाडे प्रत) जे जेधे शकावलीस दुजोरा देते.
  • ६ कलमी बखरसुद्धा दादोजी कोंडदेव मलठनकर म्हणून उल्लेख करते.
  • गोविंद सखाराम सरदेसाई संकलित ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी या ग्रंथानुसार दादोजीपंत शांडिल्य गोत्रीय ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण असून त्यांचे आडनाव पारनेरकर दिले आहे. (यासाठी ग्रंथकार संदर्भ देत नाहीत.)

आता दादोजीपंतांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊ

  • ०४/१२/१६३३ (ज्युलियन दिनांक) या दिवशी पुणे परगण्यातील महमदवाडी येथील जाऊ पाटीलाने सभेतील लोकांसमक्ष लिहून दिल्लेल्या पत्रात ह्या संबंधी उल्लेख येतो की “….बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलखास गेला त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो. सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवाण झाले. त्यांनी मुलुख लावला…." याच सभेतील आणखी एका पत्रात दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख येतो “….राजश्री दादाजी कोंडदेऊ सुभेदार येऊन गावाची गाव लाविला…." (ओसाड झालेल्या गावाचा विकास केला.)
  • ६ कलमी शकावली अनुसार “शके १५५७ युवानाम संवत्सरी शाहजीराजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी आदिलशाहीकडून जाली. सरंजामास मुलुख दिले त्यात पुणे देश राजाकडे (शहाजीराजांस) दिला. राज्यांनी आपल्या तर्फेने दादाजी कोंडदेव मलठनकर यांसी सुभा सांगून पुणीयास ठाणे घातले. तेंव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरला शांती केली. मग सुभेदार यांनी कसब्याची व गावागनाची प्रांतात वस्ती केली....”
  • कृष्णाजी अनंत कृत सभासद बखरीत म्हटले आहे की "….शहाजी राजे यांसी दौलतेमध्ये पुणे परगणा होता. तेथे दादाजी कोंडदेव शाहाणा चौकस ठेविला होता...."
  • ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १, लेखांक ४८ मध्ये आदिलशहा खंडोजी आणि बाजी घोरपड्यांस ०१/०८/१६४५ (ज्युलियन दिनांक) या दिवशी शहाजीराजे भोसल्यांचा अपमान केल्यावर कोंढाणा परिसरात धामधूम करणाऱ्या त्यांच्या मुतालिक दादोजी कोंडदेव आणि त्यांच्या समेत असणाऱ्या लोकांचे पारिपत्य करायला जाण्याचा आदेश देतो. इथे दादोजीपंतांस शहाजीराजांचा विश्वासू असल्याने हरामखोर म्हटले आहे.
  • मुरार जगदेव आणि रायाराव यांच्याकरवी आदिलशहाने पुणे प्रांत जाळून भस्मसात केला होता, त्या नंतर दादोजीपंतांनी त्या प्रांती केलेल्या कार्याबद्दल खंडो अनाजी मलकरे संकलित ९१ कलमी बखर २० व्या कलमात (राजवाडे प्रत) सांगते "….शाहाजीराजे यांणी दादाजी कोंडदेऊ कुलकर्णी माजे मलटण ता पाटस पाए पुर्णे लिहिणार इमानी जाणून त्यांचे स्वाधीन मुल्क कुल येखतीयारी देऊन ठेविले पागा हजार सरदार पोक्त सरसिदी हिलाल इपसी तैनाती केले त्याउपर मुरार जगदेऊ विज्यापुरास गेले दादाजी कोंडदेऊ त्यांचे स्वाधीन मुलूक केला ते समई सांगितले जे चिरंजीव व स्त्री जुनरी आहेत त्यांस आपल्यापासी आणून माहाल बांधून उमयेतास अन्नवस्त्रें देऊन चिरंजीवास शाहणे करणे हे आज्ञा करून शहाजी राजे विजयापुरास गेले दादाजीपंती सिवनेरीहून जिजाऊस व सिवुबास आणून पुर्णे वसऊन लालमाहाल बांधोन उभयेतोस बरें इनतीने ठेविलीं बसें व अलंकार उत्तम करून आपल्या संनीध ठेविली…." पुढे २१ व्या कलमात म्हटले आहे की "….दादाजीपंत पुण्यामधे मर्यादेनें जिजाऊंचे चालवीत होते. सिउबास शाहाणे केले, घोडे फिरवणे वैसे तरबेंत केले. दादाजीपंती मोरो तानदेऊ त्यांस कौल देऊन ज्या स्थळी होते तेथून आणिले मुलुक कुल आबाद केला चोर नाहीसे केले मगास मारिले चोर लांडगे वापर नाहीसे केले बदल इंसाफ बहुत होता. जाते सुली दिहे का खेटे मारे त्या स्थली सिवापुर पेठ बसविली. बागशाही अंबराई वगैरे झावें इरसाल महाराज शाहाजीराजे त्यांचे नांवें केला…."
  • मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीत म्हटले आहे की "….मावले बारा उजाड पडली होती. तेथे लांडगे होते त्यासी अशी ताकीद केली कि जो लांडगे मारील त्यासी शिर्पाव देवू. त्याजवरून लोकांनी कस्त करून लांडगे मारिले. मुलुख निरुपद्रव केला. मावळे लोकांस ताकीद केली जे तुम्हास वतनाची गरज असली तर वस्ती करणे. मावले लोकांनी उत्तर केले की कौल सादर झाल्यावर त्याप्रमाणे मुलुकाची आबादी करू त्याजवरून दादाजीपंतानी रयतेस कौल दिला." दादोजीपंतांनी सारा वसुलीचे प्रमाण ठरवून दिले याचा तपशील देखील या बखरीत दिला गेला आहे “पहिले साली दर बिघा रुका एक, दुसरे साली रुके सुमारे तीन, तिसरे साली दर बिघा रुके सहा, चवथे साली दर बिघा रुके नऊ, पाचवे साली दर बिघा रु % (४ आणे), सहावे साली दार बिघा रु .//. रुपया (८ आणे), सातवे साली दर बिघा एक रुपया. त्याजवर आठवे साली मलिकंबरी जमाबंदी ठरली. मुलुख मजूर लोक चोर नाहीसे जाहाले. मवास होते ते तमाम मारिले. इनसाफ बहुत करीत होते. जाते सुली दिले होते, कसबे खेडेबेरे तेथे शिवापूर पेठ वसवली…."
  • पुरंदरे दफ्तर खंड ३ मध्ये दादोजी कोंडदेव यांच्या कार्याच्या अनुषंगाने खेडबोऱ्याच्या देशपांडे करीन्यातील आलेला उल्लेख सांगतो की “….दादोजी कोंडदेव सुभेदार कसबीयात होते. ते वेळेस राजश्री साहेब (शिवछत्रपति) फार लहान होते. राजेश्री महाराज साहेबी (शहाजीराजे) मातोश्री आऊसाहेब (जिजामाता) व तुम्हास खेडेबारीयात दादाजीपंताशी पाठविले. त्यावेळी रहावयास वाडा बापूजी मुद्गल यांच्या वाडीयात होता आणि तुम्हास वाडा बांधण्याची तजवीज केली. उद्यमी लोकांची घरे पाडून ती जागा वाडीयास केली. त्या उद्यमी लोकांच्या कुळास वसाहतीस जागा पाहिजे म्हणून कसबियाचे शिवारात पेठ वसवावयाचा तह केला. पेठेचे नाव शिवापूर ठेविले. तेथील उद्यमी लोकांना बारा वर्षपर्यंत करात सवलत दिली जाईल असा कौल दिला. दादोजी कोंडदेवाने खेड येथे शहाबाग केली. दादोजीने शिवापूर येथे शहजीराजाच्या नावे बाग करून या बागेला शहाबाग असे नाव दिले. संभाजीराजे व शिवाजीराजे यांच्या नावे त्यांना अनुक्रमे संभापूर व शिवापूर अशी नावे ठेवली. अशी दोन नवी गावे वसवली…."
  • पेशवे दफ्तर खंड २२, लेखांक २९२, २८/०६/१७३५ (ज्युलियन दिनांक) या दिवशी म्हणतो “….आषाढ वद्य ४ शुक्रवारी राजश्री पंतप्रधान यांनी राजश्री शिवाजीराजे यांचा लालमहाल राजश्री दादाजी कोंडदेऊ यांणी राजश्री शहाजीराजे याचे कारकीर्दीस बांधला होता….

दादोजीपंत गेल्यावर त्यांच्याप्रति शिवछत्रपति आणि भोसले कुळात केवढा आदरभाव होता याची कल्पना आपल्याला पुढील पत्रं देतील

  • शिवचरित्र साहित्य खंड २, लेखांक ११० मध्ये ०७/१०/१६७५ (ज्युलियन दिनांक) या दिवशी म्हटले आहे की "….साहेब (शिवछत्रपति) कोणाला नवे करु देत नाहीत. दादोजी कोंडदेवाच्या कारकिर्दीत जे चालत आले असेल तेच खरे…."
  • शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २, लेखांक १४०० मध्ये २६/०६/१६६१ (ज्युलियन दिनांक) या दिवशी म्हटले आहे की "….वैकुंठवासी साहेबांचे (शहाजीराजे) व दादाजीपंतांचे कारकिर्दीत चालिले आहे. ते करार आहे तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे…."
  • शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २, लेखांक १४०५ मध्ये ०२/०८/१६७१ (ज्युलियन दिनांक) या दिवशी म्हटले आहे की "….साहेबी (शिवछत्रपतिंंनी) हुकुम केला की दादाजी कोंडदेव व रा। साहेब (शहाजीराजे) यांचे कारकिर्दी चालल्याप्रमाणे वर्तणे…."
  • शिवचरित्र साहित्य खंड ३, लेखांक ३९९ मध्ये पुरंदरकर सरनाईक घराण्याच्या २९/०८/१६७४ (ज्युलियन दिनांक) च्या लेखात शिवछत्रपतिंंनी पुढील उद्गार नीळकंठ महादेव सरनाईक यांना लिहिलेल्या पत्रात काढल्याचे म्हटलेले आहे "….दादोजी कोंडदेव आम्हाजवळ वडिली ठेवून दिले होते. ते मृत्यू पावले आम्ही निराश्रित झालो…."
  • पेशवे दफ्तर २२, लेखांक ५२ मध्ये पुण्यश्लोक छत्रपति शाहू महाराज ३०/०१/१७३६ (ज्युलियन दिनांक) या दिवशी एका पत्रात दादोजी कोंडदेव यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत म्हणतात की “….मागे दादोजी कोंडदेव लहानसाच ब्राह्मण झाला. परंतु त्याने जे इन्साफ केले ते अवरंगजेब पादशहासही वंद्य जाहले….

उपरोक्त समस्त उल्लेख बघता दादोजी कोंडदेव यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यांची प्रचिती येते तसेच त्यांची भोसले कुळाशी असलेली निष्ठा आणि भोसल्यांच्या राजवंशात असलेला त्यांच्यावरचा विश्वास, आदरबुद्धी स्पष्ट जाणवते. दादोजीपंत हे कर्मकठोर, न्यायनिष्ठुर आणि कार्यकुशल होते याबाबत वरचे उल्लेख बघता किंतु रहात नाही. तेव्हा बौद्धिक, शारीरिक जडणघडण व्हायच्या काळात असा कर्ता पुरुष अवतीभवती सतत वावरत असताना शिवछत्रपतिंसारखा गुणग्राहक असामान्य पुरुष (माझ्यालेखी युगपुरुष) त्यांच्या वर्तनातून, आचरणातून, कार्यातून काही शिकणार नाही, काही बारकावे आत्मसात करणार नाही असे होणे केवळ अशक्य. दादोजीपंतांनी केलेल्या कित्येक व्यवस्था पुढे स्वराज्यात ते निवर्तल्या उपरांतही कैक दशकं निर्वेध चालू होत्या आणि त्यांची महती पिढ्यान्पिढ्या पुढे जात होती यावरून त्यांचे शिवछत्रपतिंंच्या आयुष्यात आणि मावळ भागात काय स्थान होते याचे आकलन सुज्ञास झाले नाही तर आश्चर्य !


संदर्भ सूचि :-

  • ९१ कलमी बखर
  • मराठा साम्राज्याच्या छोटी बखर
  • जेधे शकावली, ६ कलमी शकावली
  • शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २
  • शिवचरित्र साहित्य खंड २
  • शिवचरित्र साहित्य खंड ३
  • पुरंदरे दफ्तर खंड ३
  • ऐतिहासिक फारसी साहित्य खंड १
  • ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी
  • चित्र स्रोत :- Google Image Result for https://www.maayboli.com/arch/1/shivaji/images/nangarani.gif

     

    भवानी तलवार

    श्रीमंत छत्रपती शिवाजी महारांजाकडे ३ नावाजलेल्या तलवार होत्या . जगदंबा ,भवानी ,तुळजा

    त्याशिवाय महाराजांकडे खंडा ,धोप ,समशेर आणि त्याकाळच्या विविध आकारच्या आणि लढाई प्रसंगानुरूप तलवारी होत्या. .तसेच सुरक्षा म्हणून कट्यार , वाघनखं , बिचवा , हे छोटे शस्त्र तर होतेच .आणि शरीर सुरक्षा म्हणून डोईवर जिरेटोप ,लोह चिलखत ,उजव्या मुठीत दांडपट्टा असे .पायात चामडी घट्ट मोझडी. फार कमी जणांना ठावे असेल महाराज धनुष्यबाण चालवण्यात वाकबगार होते.

    समशेर हि मोगली तलवार ,तर खंडा हि मराठा तलवार , राजपुताना तलवार , पट्टा ,गुर्ज ,आरमार तलवार . त्यापैकि खंडा ,मुल्हेरि , फटका, मराठा, भवानी या मराठा तलवारी प्रसिद्ध होत्या. मराठी कल्पनेतून धोप ,खंडा ,पट्टा ,सकेला, किरच या तलवारी आकारास आल्या त्या पेकी भवानी हि तलवार पट्टा या प्रकारातील होती.(पट्टा हा इतर तरवारीपेक्षा जास्त परिणामकारक होती.)

    तत्कालीन तलवारींचा संच अभ्यासून महाराजांनी कमी वजनाच्या तसेच आकाराने अचूक भेद करणाऱ्या तलवारींचे निर्माण कार्य गडावर करण्याचे महत्वाचे कार्य केले .कारण त्यावेळी मराठा , मुघल आणि बहामनी शाह्यांच्या तलवारी पर्यायाने वजनी होत्या. शिवरायांनी आपल्या शिलेदारास आणि मावळ्यांना लढाई साठी योग्य तलवारी उपयुक्त करून दिल्या.

    महाराजांची भवानी हि तलवार आता ब्रिटनच्या राजघराण्याच्या Royal Collection Trust , Bankingham Palace London येथे आहे. सन.१८७५ मध्ये कोल्हापूर गादी चे छत्रपती चौथ्या शिवाजी ने तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स ला भेट केली होती.

    जगदंबा हि महाराजांची सुप्रसिद्ध तलवार आता लंडन च्या Bankingham palace London येथे आहे. हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवा याला भारत भेटी दरम्यान भेट करण्यात आली होती.

    तुळजा तलवार हि शिवछत्रपतींची तलवार त्याकाळीच नाहीसी झाली .त्यामुळे तुळजा तलवारीचा उल्लेख कमी मिळतो.

    भवानी तलवारीची प्रतिकृती (Reflica) ब्रिटीशांनी भारताला सुपूर्द केली .ती सिंधुदुर्ग किल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात ती ,शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर काचेच्या आवरणात ठेवली आहे . तसेच तिचीच दुसरी आवृत्ती सातारा गादी चे वंशज छत्रपती च्या संग्रह दरबारी आहे.

    भवानी तलवार , लंडन रॉयल पॅलेस संग्रहालय

    चित्रस्त्रोत : Google

    भवानी तलवारीचा इतिहास

    सध्याच्या रायगड जिल्ह्यातील गोवेले येथे शिवकाळात सावंत उपनाम असलेले राजघराणे राज्य करत होते हे सावंत घराणे शिवकाळात सुरुवातीला सिद्दीच्या राज्यअंतर्गत होते. सिद्दी चा सरदार कायसावंत आणि शिवाजी महाराजांचे सरदार बाजी पासलकर द्वितीय यांचे युद्ध सन१६५०-१६५१ सुमारास झाले. या युद्धात कायसावंत आणि बाजी पासलकर दोघेही ठार झाले. पुढे कायसावंताचा मुलगा मालसावंत हा आपल्या बिरादरीसह शिवाजी महाराजांना सामिल झाला. शिवरायांचे पायदळातील हजारी मनसबदार झाला. त्याने मालसावंताने पोर्तुगीजांनी आयात केलेली फ्रान्समधील जिनेव्हा येथे तयार केलेली एक तलवार श्री शिवाजी महाराजांना भेट केली. शस्त्रास्त्रांची योग्य पारख असणाऱ्या शिवरायांनी या तलवारीची योग्य किंमत म्हणून मालसावंत ह्यास ३०० होन दिले.आणि तलवारी चे नाव श्री भवानी असे ठेवले. पुजेत भवानी तलवारीचे स्थान होते.तसेच नवरात्रात देवी जगदंबे पुढे ९ दिवस नित्य नेमाने पूजा होत असे. प्रति मोहिमांमध्ये विजयश्री मिळत असल्याने महाराजांना भवानी तलवार प्रिय होती. मोहिमेवर जाण्यापूर्वी महाराज आवर्जून भवानी तलवार सोबत ठेवत असे.

    भवानी तलवारीचा इतिहास संदर्भ : दंडराजपुरी दुर्ग , इतिहास संकलक आप्पा परब , गुगल स्त्रोत.

    तसेच सभासद बखर ( राजापुरी कायसावंत तसेच बाजी पासलकर लढाई)

    टिप : भवानी तलवार हि गोवेले येथिल मालसावंताकडून मिळाली हे सत्य,परंतु कोणत्या साली याबद्दल इतिहासकारात मतमतांतरे आहेत १६५०,५१,५२ ,काहिंचे १६५७ .तसेच सावंताविरूदध लढलेले बाजी पासलकर

    धन्यवाद.

     

    ·
    फॉलो करा

    हो फार घनिष्ठ नाते होते

    • शहाजीराजांच्या मातोश्री म्हणजे शिवरायांच्या आजी , उमाबाई ह्या माहेरच्या दिपाबाई , जगपाळ उर्फ वणगोजी नाईक निंबाळकरांची कन्या.
    • जिजामातांच्या आऊसाहेब , म्हाळसाबई ह्या माहेरून गिरीजाबाई ज्या वणगोजींची बहीण व उमबाईंच्या आत्या.
    • शिवरायांच्या धर्मपत्नी सईबाई ह्या वणगोजींंची नात व मुधोजी नाईक निंबाळकर यांची मुलगी.
    • शिवराय व सईबाईंचे पहिली कन्या सकवरबाई उर्फ सखुबाई ही सासरची सावित्रीबाई महादजी बिन बजाजी मुधोजी नाईक निंबाळकर.

    अशी ही पिढ्यांपासूनची नाती होती निंबाळकर व भोसल्यांची.

    वेरूळ मराठवाडा औरंगाबाद , येथिल जमीनदार पाटील बाबाजी भोसले हे मराठा पाटिल., त्यांचे पुत्र मालोजी विठोजी , मालोजी विठोजी हे अहमद्नानगरच्या निजामशाहीत सरदार होते , मालोजीराजेना शहाजी शरीफजी हे २ मुले होते. शहाजी राजेना जेष्ठ पुत्र संभाजी त्यानंतर ४ मुली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे शिवराय हे शहाजीराजे ,जिजाऊ चे सहावे अपत्य होते. शिवरायांना जेष्ठ बंधू जे पिताश्री शहाजीराजे सोबत आदिलशाहीत बंगळूर ला होते 1664, ला अफजलखानामुळे मारले गेले.(शहाजिराजेंच्या आधी) तसेच शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजी एकोजीराजे हे तंजावर येथे राज्य करीत होते.

    एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज हे पराक्रमी मराठा सरदार होते आणि पराक्रमाची शौर्याची त्यागाची धार्मिकतेची वैभवशाली परंपरा त्यांच्या घराण्यात पूर्वापार होती , त्याच शूरवीर पराक्रमी भोसले कुळात छत्रपती शिवरायांचा जन्म झाला .

    .बाबाजी भोसले ( १५३३ -मृत्यू १५९७ ).मालोजीराजे भोसले (१५५२ ते १५९९ ) .शहाजी राजे भोसले ( १५९४ किवा ते १६६४ होद्देगिरी बंगळूर ) , छत्रपती शिवराय ( १६३० ते १६८० रायगड ) छत्रपती संभाजी (१६५७ ते १६८९ बहादूरगड संभाजीनगर ).

    मुरार जगदेव ने पुण्याची राखरांगोळी केली त्याच पुण्यात शिवबांनी सोन्याचा नांगर फिरवून मराठमोळ्या कृषीजनांच्या संस्कृतीचा जागर केला व स्वराज्य निर्मितीचे रणशिंग फुंकले .

    निजामशाहीत भर दरबारात लखुजीराव जाधव व अचलोजी, रघोजी,यशवंतराव यांचा २५ जुलै १६२९ या दिवशी निझामशाहाने खून केला. जिजाऊंच माहेर उध्वस्त झालं. मोगलांचा,आदिलशहाचा मराठी मातीवर धुमाकूळ चालूच होता याचवेळी आऊसाहेब गर्भवती होत्या त्यांना सुखरूप ठेवायचे कुठे असा शहाजी राजेंच्या मनात विचार घोळत होता शेवटी सह्याद्रीच्या खांद्यावरचा एक बुलंद किल्ला आठवला तो म्हणजे शिवनेरी.....शहाजीराजेंनी लगेच जिजाबाईंची रवानगी शिवनेरीवर केली.एवढ्यात पुण्यात होळी पेटली आदिलशहा खवळला.वजीर खवास खानाने मोठी फौज पाठवून पुण्याची होळी केली.शाही सैनिक थैमान घालू लागले.शहाजीराजांचे वाडे पेटवले.रायारावाने अक्षरशः ३९० वर्ष्यापुर्वी मराठी मातीवर नांगराला गाढव बांधून फिरवला आणि पुण्याचा कसबा बेचिराख केला.फुटक्या कवड्याची व तुटक्या वहानांची माळ लटकवून अन एक भली मोठी लोखंडी पार भर रस्त्यात ठोकून आदिलशाही फौज विजापूरला परतली.मुरार जगदेव पंडिताने पुण्यातील लष्करी ठाणे यवतच्या भुलेश्वराच्या डोंगरावर नेले व तेथे किल्ला बनवून "दौलतमंगळ" असे नाव दिले. पुण्यात उरलं फक्त कुत्र्याचं रडणं व घारी गिधाडांचं आभाळात भिरभिरणं, पुरतं पुण्याचं स्मशान झालं.शहाजी राजे भोसलेंच्या पुणे बेचिराख झालं.आऊसाहेब शिवनेरीवर स्वराज्याचं स्वप्न पाहत होत्या व सह्याद्रीकडे मोठ्या आशेने पाहत होत्या अन सह्याद्रीही जिजाऊं कडे मोठ्या आशेने पाहत होता व चमत्कार झाला जिजाऊसाहेबांच्या उदरी १९ फेब्रुवारी १६३० शुक्रवार,शिवनेरीवर सह्याद्रीचा छावा जन्माला आला.सह्याद्रिलाही आनंद झाला. नंतर काही वर्ष अशी लोटली.त्यानंतर इ.स १६४१ च्या सुमारास आऊसाहेब व शिवबा स्वराज्य निर्मितीचं स्वप्नं उराशी बाळगून पुण्यात प्रवेशले,तेव्हा पुण्याची मसणवाट झालेली पाहुन आऊसाहेबांच काळीज करपले.राहण्यासाठी सुद्धा ओसरी उरली नव्हती.शेवटी काहीदिवस झांबरे पाटलांच्या वाड्यात बिराड थाटावं लागलं.कसबा गणपतीचा जीर्णोद्धार केला.हळू हळू माणसं रस्त्यावर येऊ लागली.पुण्यातली लोखंडी पहार उखडली,वाघांचा,बिबट्यांचा अन लांडग्या- कोल्ह्यांचा व गावगुंडांचा धुमाकूळ थांबवला, कृष्णाजी नाईक,फुलाजी नाईक,बाबाजी नाईक इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं.बावनकशी सोन्याचा नांगर फिरवला, शेतकरयांना बळ दिले .कृषि संस्कृती उजागर केली.,मराठी माती सुखावली अन पुण्याचं रूप पालटलं.बारा बलुतेदार आनंदाने उद्योग करू लागले. पर्वती जवळच्या ओढ्याला बांध घातला जिजाऊ जातींन स्वतः न्यायनिवाडे करू लागल्या.वाडाही बांधायला जागा निवडली भूमिपूजन करून चिरा घातला गेला,लालमहाल पूर्ण झाला.शिवबा व आऊसाहेब लालमहालात राहायला आल्या.अन स्वराज्य निर्मितीचे तोरण उभारण्यात आले व गुलामगिरीचे पंख छाटून त्यात स्वातंत्र्य आणि स्वराज्याचे प्रेरणादायी विचार सह्याद्रीत घुमायला लागले.

    शिवरायांचा पुढचा इतिहास सर्वश्रुत सुविख्यात आहे . दैदिप्यमान आहे. कशाप्रकारे शिवरायांनी ५ तत्कालीन प्रस्थापित परकिय बहामनी शाहि अन् बलाढ्य मोगल शाही विरूद्ध लढा देऊन शुन्यातून साम्राज्य उभे केले ज्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.

    ऐसा राजा होणे नाही

    जय भवानी

    चित्रस्त्रोत : Google

     

    शिवाजी महाराजांनी वाघनखं वापरली असं समकालीन ग्रंथ असणारं शिवभारत म्हणत नाही…

    त्याचबरोबर वेगवेगळी साधनं वेगवेगळं सांगतात…

    त्यामुळं हे वाघनखं प्रकरण केवळ सभासद बखर म्हणते, ती १६९७ सारी लिहून पूर्ण झाली. शिवभारतात १६७३ पर्यंतचा कार्यकाल नमूद आहे… म्हणून विश्वसनीय कागदपत्र म्हणून त्याचा क्रमांक वरचा लागतो, असं तज्ज्ञ लोक सांगतात…

    बरं वाघनखं कुणी दिली वगैरे याबद्दल सभासद बखरीत काही आढळत नाही.

     

    अनेक प्रसंग आहेत शिवरायांसारखा अष्टावधानी राजा , निर्णय आणि न्याय ,निवाडा देताना कधी चुकूर होऊ देत नव्हता किंवा वेगवान न्यायनिवाडे करण्याकडे कल होता कारण असंख्य कामे , योजना आणि मोहिमा असल्याने त्यांच्या कडे वेळ केवढासा ? अफाट कामे करायची होती , दिल्ली चे तख्त भगव्याची वाट बघत होते .शिवाय शंभूराजे आणि राजाराम यांना उत्तर दक्षिण हिंदुपदपातशाहि हे त्याकाळी तरी अश्यक्यप्राय वाटणारे मनसुबे त्यांना प्रत्यक्ष स्वरुपात आणायचे होते.

    नंतरचे म्हणजे आजचे काही इतिहासकार , प्रतापराव गुजर संदर्भात एक टिप्पणी वाचनात आढळून येते कि ,बहलोलखानास गर्दिस मिळविले बिगर आम्हास तोंड दाखवू नये याबाबत महाराजांना तोषिस लावतात ,महाराजांचा तोल सुटला होता , परंतु तत्कालीन अक्षम्य चुक प्रतापराव सारख्या बलाढ्य सेनापती कडून दयाभावनेने घडली होती. त्याचे पर्यवसान. महाराजांचे खरमरित पत्र ,पुढे प्रतापरांवाची पराकाष्ठा पराक्रम, आत्माहुती आणि बलिदान.

    महाराजांचा राज्याभिषेक होण्याआधी , अष्टप्रधान मंडळ नेमण्याआधी , राजसदरेवर म्हणजे राजसभेत शिवरायांचे राज्यकारभार चाले. राजगडावर महाराजांचे वास्तव्य विसेक वर्ष होते. तैव्हाहि राजप्रशासन , अर्थनीती, राजसदर , सेनापती, कारभारी , पेशवा ,पंडित , लेखनीक , सुरनीस ,गडकरी , डबीर ,वकिल , गुप्तहेर खाते , नजरबाज , गडकरी, सैन्य ,सेवक, पत्रव्यवहार , नोंदि , लेखनकार्य, रयतेचे न्यायनिवाडे, दंड ,शिक्षा , कृषिजनांचे कारभार , व्यापार ईत्यादि बाबी राजसदरेवरून होत . शिवाजी महाराज हे स्वराज्याचे सर्वोच्च शासक आणि त्यांचा शब्द नि आदेश अंतिम असे.

    दरबारातील काही नोंदी.

    १.एकदा शिवाजीसमक्ष त्यांचे सैनिकांनी गावाच्या प्रमुखाला धरून आणले. तो रुबाबदार व्यक्ती होता. परंतू आज त्यावर एक विधवेची अब्रू लुटण्याचा गुन्हा सिद्ध झालेला होता. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा राजेंचे वय मात्र १४ वर्ष असे होते. तरी ते बहाददर, निडर आणि न्यायप्रिय होते आणि महिलांसाठी त्यांच्या मनात असीम सन्मान होता. त्यांनी तात्काळ निर्णय केला की या व्यक्तीचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून द्या, अश्या भयंकर गुन्ह्यासाठी याहून कमी शिक्षा होऊच शकत नाही.

    * एकेकाळी पुण्याजवळ नचनी गावात एका चित्त्याच्या दहशतीमुळे लोकं हैराण होते. तो अचानक हल्ला करायला आणि जंगलात गायब होऊन जायचा. गावकरी आपली समस्या घेऊन शिवाजींकडे पोहचले आणि भयानक चित्त्यापासून बचावाची विनंती करू लागले. महाराज, चित्ता किती तरी मुलांवर वार करून चुकला आहे तसेच आम्ही झोपी गेलो तो घात करतो. गावकर्‍यांची समस्या ऐकून महाराज म्हणाले, काळजी नसावी, मी आहे आपल्या मदतीसाठी. शिवाजी राजेनी येसाजी सह जाऊन चित्याचा फडशा पाडला.

    स्वराज्यवॄध्दीबरोबरच त्या प्रदेशाची शासकीय व्यवस्था लावणे महत्त्वाचे, नाहीतर परत तो भाग मोगल वा इतर शाह्यांकडे जायचा हे महाराजांनी ओळखले व त्यादॄष्टीने पाऊले उचलली. (पुढे जेव्हा मराठे उत्तरेत गेले, तेव्हा त्यांनी त्या प्रदेशाची व्यवस्था न लावता फक्त खंडण्या घेतल्या, त्यामुळे दर एक-दोन वर्षांनी त्याच त्या राजांना जिंकणे क्रमप्राप्त झाले व मराठेशाही दुबळी झाली).

    महाराजांची शासन व्यवस्था प्रचलित मुसलमानी शासन व्यवस्था व भारतीय नीतीशास्त्र यांवर आधारलेली होती. महाराज हे प्रशासनाचे प्रमुख होते. राजकीय प्रशासन व्यवस्थेबरोबरच स्थानिक, लोकारूढ शासनसंस्था आणि वर्णाधिष्ठित जातीव्यवस्थादेखील कार्यरत होत्या.

    राजशासनाची प्रमुख सात अंगे: राजा, मंत्री, मित्र, कोष, राष्ट्र, दुर्ग आणि सैन्य. यांपैकी एकही अंग कमी पडल्यास राज्य नाश पावे. 'राजा कालस्य कारणम्' अशी या प्रशासनाची व्यवस्था होती. स्मृत्यादी ग्रंथांनी धर्माची मर्यादा श्रेष्ठ मानून राज्य व समाजाची सर्व व्यवस्था त्यांच्या कक्षानुरुप मर्यादित केली आहे. राज्यधर्मामध्येच राष्ट्रपालन, प्रजार्तिनिवारण, धर्मपालन ह्यांचा समावेश होता. ही सर्व कार्ये पार पाडण्यासाठी राजास प्रधानमंडळ निर्माण करावे लागे व त्यांच्याद्वारा कार्याची वाटणी करुन प्रशासन करावे लागे. मुसलमान पध्दतीमध्ये 'रख्तखाना' ही संस्था असे, पण तिचे स्वरूप थोडे वेगळे होते. 'सप्तांगम राज्यम'ची अमंलबजावणी करण्याकरता महाराजांनी प्रधानमंडळ स्थापन केले.

    अष्टप्रधान मंडळाची निर्मिती व वाढ राज्याच्या विस्ताराबरोबरच होत गेली. महाराज बंगळुराहून परतताना शहाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर नीळकंठ पेशवे, बाळकृष्णपंत दीक्षित, हणुमंते, मुजुमदार (राज्याचे अमात्य), सोनोपंत डबीर (सुमंत), रघुनाथ बल्लाळ सबनीस (सेनालेखक) असे अधिकारी दिले होते. १६४९ मध्येच महाराजांनी तुकोजी चोर यांना तेव्हा असलेल्या लष्कराचा सरनौबत नेमले होते. (म्हणजे प्रधानमंडळाची कल्पना ही स्वराज्य बाल्यावस्थेत असतानाच निर्माण झाली व अवलंबली गेली). पुढे सरनौबती ही माणकोजी दहातोड्यांकडे व नंतर नेताजी पालकरांकडे आली. तेव्हा फौज सात हजार व पागा (घोडेस्वार) ३००० होती. अण्णाजी दत्तो, मोरोपंत पेशवे, सोनोपंत डबीर, निराजीपंत, शामराव नीळकंठ ही मंडळी राज्याभिषेकाच्या आधीपासूनच स्वतंत्रपणे आपापली कार्यक्षेत्रे सांभाळत होती. राजे या सर्व लोकांची मसलत घेऊनच पुढील कार्य आखत. पुढे जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा महाराजांनी खालील पदे निर्माण केली. ही पदे निर्माण करताना त्यांनी फार्सी शब्द टाळून मराठी प्रतिशब्द आणण्यावर भर दिला. त्यासाठी रघुनाथराव हणुमंतेंना नवीन मराठी कोष करावयास सांगितले.

    अष्टप्रधान व त्यांच्या जबाबदार्‍या:

    १. मुख्य प्रधान (पेशवा) : सर्व राज्यकार्य करावे. राजपत्रांवर शिक्का करावा, सेना घेऊन युध्दप्रसंग करावा. प्रदेश स्वाधीन होईल त्याचा रक्षून बंदोबस्त करुन महाराजांच्या आज्ञेत वर्तावे. सर्व सरदार व सेना यांनी त्यांजबरोबर चालावे. मोरो त्रिंबक पिंगळे हे पेशवे झाले व त्यांचा वार्षिक पगार १५००० होन ठरला. ( एक होन म्हणजे साधारण तीन ते चार रुपये).
    २. अमात्य (मुजुमदार): -राज्यातील जमाखर्च ठेवावा. दफ्तदरदार व फडणीस यांच्याकडुन त्यांची कामे करून घ्यावी. फडणिशी व चिटणिशी पत्रांवर निशाण करावे. नारो व रामचंद्र नीळकंठ ह्या बंधुद्वयांकडे हे पद आले. तनखा १२००० होन ठरला.
    ३. सचिव (सुरनीस) : राजपत्रे वाचून त्यातील मजकूर शुध्द करावा. राजपत्रांवर 'संमत' अशा शिक्का करावा. अण्णाजी दत्तो हे सचिव झाले.
    ४. मंत्री (वाकनीस) : यांनी सर्व राजकारण सावधानतेने करावे. राजाची दिनचर्या लिहून ठेवावी. युध्दादि प्रसंग करावा. दत्ताजी त्रिंबक हे मंत्री झाले.

    हे चार प्रधान महाराजांच्या उजवीकडे बसत.

    ५. सेनापती (सरनौबत): सर्व सैन्याचा मुख्य अधिपती, युध्दप्रसंग करावा. हंबीरराव मोहिते हे सेनापती झाले.
    ६. सुमंत (डबीर) : परराज्यांच्या विचार करावा. त्यांचे वकील आले तर सत्कार करावा, आपले वकील धाडावेत. रामचंद्र त्रिंबक हे सुमंत झाले.
    ७. न्यायाधीश: यांनी सर्व राज्यांतील न्याय-अन्याय धर्मतः करुन राजास निवेदन करावे. निराजी राऊजी हे न्यायाधीश झाले.
    ८.पंडितराव (दानाध्यक्ष): यांजकडे सर्व धर्माधिकार होता. दान धर्म करणे, अनुष्ठान करणे हे सर्व यांच्या अखत्यारीत.

    शेवटच्या सहाही प्रधानांचा सालीना तनखा १०००० होन ठरला.

    राज्याचे प्रांत आखून ते अष्टप्रधानांच्या हवाली करण्यात येत. जेव्हा अष्टप्रधान स्वारीवर जात तेव्हा त्यांचे मुतालिक त्यांचा कारभार पाहात. अष्टप्रधांनाच्या कचेरीस प्रत्येक काम पाहायला दरकदार नेमले जात. त्यात मुख्यत: १. दिवाण, २. मुजुमदार, ३. फडणीस, ४. सबनीस, ५. कारखानीस, ६. चिटणीस, ७. जामदार (खजिनदार) व ८. पोतनीस (नाणेतज्ञ) असत.

    चिटणिसाचा हुद्दा अष्टप्रधान मंडळात समाविष्ट नाही. चिटणीस हा महाराजांचा मुख्य लेखक. राजमंडळात त्याचा समावेश होता. राज्यातील सर्व राजपत्रे लिहिण्याचे काम त्याच्याकडे होते. उत्तरेही तोच लिही. इनामासंबधी कागदपत्रांची व्यवस्थाही फडणीसच करी.

    अष्टप्रधानांकडे पुढील कारखाने व महाल यांची व्यवस्था लावण्याचे काम होते. राज्याची घडी या कारखान्यांवर व महालांवर अवलंबून होती.
    कारखाने:
    १. खजिना २. जवाहिरखाना ३. अंबारखाना (हत्ती) ४. शरबतखाना (औषधे) ५. तोफखाना ६. दफ्तरखाना ७. जामदारखाना (नाणी) ८. जिरातखाना (शेती). ९. मुतबकखाना १०. उष्ट्रखाना ११. नगारखाना १२. तालीमखाना १३. पीलखाना १४. फरासखाना १५. अबदरखाना (पेये) १६. शिकारखाना १७. दारूखाना व १८. शरतखाना.

    महाल:
    १. पोते (खजिना) २. सौदागर (माल) ३. पालखी ४. कोठी ५. इमारत ६. बहिर्ला (रथ) ७. पागा ८. शेरी ९. दरुणी १०. थट्टी (खिल्लार) ११. टांकसाळ व १२. छबिना.

    राज्यकारभार:
    प्रांताच्या बंदोबस्तासाठी राज्याचे दोन विभाग केले गेले. एक सलग असणार्‍या प्रदेशाचा व दुसर्‍या विखुरलेल्या दक्षिणेकडील प्रदेशाचा. पहिल्या मुलखाचे तीन भाग केले. पेशव्यांकडे उत्तरेकडील प्रदेश दिला त्यात कोळवनातील सालेरपासून पुण्यापर्यंतचा वरघाट व उत्तर कोकणाचा समावेश होता. मध्यविभागात दक्षिण कोकण, सावंतवाडी व कारवार हा भाग होता - हा सचिवाकडे सोपविण्यात आला. तिसर्‍या भागात पूर्वेकडील वरघाटाचा प्रदेश म्हणजे सातारा-वाई ते बेळगाव कोप्पळपर्यंतचा प्रदेश - हा भाग मंत्र्यांकडे सोपवण्यात आला. कर्नाटकाचा स्वतंत्र सुभा करुन त्यावर हंबीरराव मोहिते व रघुनाथ नारायण अमात्य यांची नेमणूक केली गेली. या सर्व विभागांवर सरसुभेदारांची नेमणूक होई व ते प्रधानांबरोबर काम करीत. यास राजमंडळ म्हणत. किल्लेदार व कारकुन वर्गाची नेमणूक स्वत: महाराज करीत. या प्रदेशातील सैन्य प्रधानमंडळ हवे तसे कमी जास्त करू शकत असे. दरवर्षी प्रधानांनी हिशोब महाराजांना सादर करायचा अशी व्यवस्था असे.

    विभागीय कारभारात सरसुभेदार मदत करीत, त्यांना देशाधिकारी म्हणत. पुढील सरसुभ्यांचे उल्लेख पत्रात मिळतात:
    १. कल्याण-भिवंडी २. तळकोकण ३. कुडाळ ४. पुणे ५. सातारा-वाई ६. पन्हाळा ७. बंकापुर ८. कोप्पल.
    दोन-तीन सुभ्यांची व्यवस्था पाहायला एका सरसुभेदाराला ठेवण्यात आले.

    मुसलमानी राजवट व शिवाजी महाराजांची राज्यववस्था ह्यातील मुख्य फरक म्हणजे हे सरसुभे महसुली विभाग नसून विशेषतः कारभार व्यवस्थेसाठीच केले गेले. त्यामुळे सुभेदार मनमानी करु शकत नसत. (पुढे मराठा मंडळ जेव्हा स्थापन झाले तेव्हा हे सुभे महसुलीपण केले गेले त्यामुळे शिंदे, होळकर, गायकवाड सारखे सरदार नंतर स्वतंत्र राज्य करू लागले.) यावरुन शिवाजी महाराजांचे लक्ष आपल्या प्रांतीय कारभारात किती होते हेच दिसून येते.

    दोन महाल मिळून लाख-सव्वालाख महसुलाचा एक सुभा होई. सुभेदाराच्या मदतीस मुजुमदार, सभासद, चिटणीस, सबनीस असे अधिकारी असत. सुभ्याच्या बंदोबस्तीकरता शिंबदी असे. सुभेदारास सालीना ४०० होनाचा तनखा व मुजुमदारास १२५ होनाचा तनखा मिळत असे. सुभेदारास सरकारी करवसुलीचे कामी प्रजेचे परंपरागत अधिकारी परगण्याचे देशमुख व देशपांडे यांच्यावर अवलंबून राहावे लागत होते. जमिनीची लागवड व वसाहत करवून सरकारचा सारा गोळा करणे हे देशमुखाचे मुख्य काम असे. वसुली करण्याकरता देशमुखास महसुलाच्या उत्पन्नावर शेकडा ५ टक्के मोबदला मिळे. सरकारचे सर्व हुकूम जनतेपर्यंत नेणे व त्यांचे पालन करने ही देशमुखाची मुख्य जबाबदारी. देशपांडे हा देशमुखाच्या सर्व हिशोबाचे व दफ्तराचे काम पाही. त्यास देशमुखाचा निम्मा हक्क मिळे. महालावरील अधिकार्‍यास हवालदार म्हणत. सर्व सरकारी अधिकार्‍यांना वतन न मिळता वेतन मिळे. सरकार सेवेबद्दल मोकासा अथवा जमीन लावून धरण्याची पद्धत त्यांनी बंद केली त्यामुळे देशमुख, देशपांड्यास जनतेवर बळजबरी करता येत नव्हती.

    गाव अथवा खेडे हे स्वराज्यातील एक महत्त्वाचा घटक होते. एखादे खेडे हे सर्व बाबतीत स्वंयपूर्ण असे. त्यामुळेच राज्य कोणाचेही असले तरी त्या भागातील अर्थव्यवस्थेवर फार परिणाम होत नसे. प्रत्येक खेड्यात बारा बलुतेदार असत, त्यांचे सर्व व्यवसाय हे जातीवर अवलंबून असत. आपल्या जातीबाहेरचे व्यवसाय कोणी करत नसल्यामुळे प्रत्येक जातीला आणि त्या व्यवसायांना समाजात निश्चित असे एक स्थान होते.

    शिवशाही धारापद्धत- शिवकाठी:

    जमिनीचा धारा ही सर्वात महत्त्वाची बाब होती. जमिनीवरील शेतसारा ठरविण्यासाठी पूर्वी मलिकंबरने ठरविलेली पद्धत अंमलात आणली गेली होती पण ती शिवाजी महाराजांनी बदलून वेगळी पद्धत लागू केली. त्यांनी जमिनीचे मोजमाप ठरविण्यासाठी काठीचे माप ठरविले. पाच हात व पाच मुठी मिळून एक काठी, वीस औरस-चौरसांचा एक बिघा व १२० बिघ्यांचा एक चावर असे जमिनीचे मोजमाप ठरविले. अण्णाजी दत्तो (सचिव) यांनी गावोगावी जाऊन जमिनीचा धारा, चावराणा, प्रतबंदी व लावणी वरुन ठरविला. चावराणा म्हणजे जमीन मोजून तिच्या सीमा ठरविणे. डोंगरी जमीनीच्या सार्‍याची आकारणी बिघ्यावर न करता नांगरावर होई. आकारणीत जमिनीच्या कसाबरोबर पिकाची जातही पाहण्यात येई. आकार (सारा) ठरवताना तीन वर्षाच्या उत्पन्नाची सरासरी घेऊन मगच सारा ठरविण्यात येई. वाजट जमीन, जंगल, कुरण, इत्यादी गावची जमीन सार्‍यासाठी विचारात घेतली जात नसे.

    खर्‍या अर्थाने ही पध्दत लोकमान्य होती म्हणूनच शिवाजी राजास 'जाणता राजा' म्हटले गेले.

    क्रमशः

    संदर्भ :- मराठ्यांचा इतिहास , संपादक अ.रा.कुलकर्णी ,ग.ह.खरे

     

    ·
    फॉलो करा

    १८१८ मध्ये जेव्हा इंग्रजांनी रायगड किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी स्थानिक लोकांना किल्ल्यावर येण्यास बंदि केले. त्यानंतर जवळपास 60 वर्षे हा किल्ला मानवरहित होता. या काळात किल्ल्यावर घनदाट जंगल वाढल्याने वास्तू ओळखणे कठीण झाले.

    १८८० मध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे पुणे ते रायगड किल्ल्यापर्यंत चालत गेले. घनदाट जंगलात लपलेली छत्रपती शिवाजी महाराजांची (जी त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधलेली) समाधी शोधून काढली. त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार करून तेथील जागेची साफसफाई केली आणि या मातीने आजवर निर्माण केलेल्या महान राजाला मनाचा मुजरा अर्पण केला.

    संभाजी महाराजांनी बांधलेली मूळ समाधी ही अष्टकोनी रचना आहे जी घुमटाच्या आकाराच्या संरचनेच्या खाली आहे. खाली समाधीचे मूळ चित्र आहे.

    पुढे १८९५ मध्ये सुप्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी श्री शिवाजी फंड समितीची स्थापना केली. त्यांनी आपल्या समितीच्या माध्यमातून निधी उभा करून समाधीची पुनर्बांधणी केली. या श्री शिवाजी निधी समितीचे नंतर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ असे नामकरण करण्यात आले.

    सद्य स्थितीतील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे छायाचित्र आहे.

     

     

     

     

     

     

     

     


     

     

     

     

     

     

     

     

     

    No comments:

    Post a Comment

    मनसर

     प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...