माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद
माढा परिसरातील उंदरगावची लढाई :-
वीरगळींची शिल्पे देताहेत उंदरगावच्या लढाईची व सोलापूर जिल्ह्याच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष! | eSakal
उंदरगावातील (ता. माढा ) ऐतिहासिक मारुती मंदिरात व परिसरात, युद्धात मरण पावलेल्या योद्ध्यांची, घोडदळ, पायदळांच्या युद्धाचे प्रसंग कोरलेली शिल्पे आहेत. ही इ.स. 25 जानेवारी 1700 रोजी झालेल्या उंदरगावच्या ऐतिहासिक लढाईत धारातिर्थी पडलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ सुमारे 320 वर्षांपूर्वी उभारली गेली असून, ती शिवछत्रपतींची व शंभू छत्रपतींची राजधानी किल्ले रायगडाचा ताबा घेऊन रायगडाला इजा पोचवणाऱ्या मुगल सरदार झुल्फीकारखानच्या उंदरगावात झालेल्या पराभवाची व लढाईत धारातिर्थी पडलेल्या शूर मावळ्यांच्या बलिदानाची साक्ष देतात.
याचा श्री. चव्हाण यांनी सांगितलेला घटनाक्रम असा, की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाला मुगल सरदार झुल्फीकारखानाचा वेढा पडल्यावर महाराणी येसूबाईंनी रायगड जिद्दीने लढवला. पण नंतर तो झुल्फीकारखानाच्या ताब्यात गेला. त्याने राजधानी रायगडावर प्रचंड नासधूस केली. छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडात डिसेंबर 1699 पासून पुढे झुल्फीकारखानाचा व मुगल फौजांचा वावर सोलापूर जिल्ह्यात वाढला. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज सोलापूर जिल्ह्यातच असून ते मुगलांची सोलापूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीची मुख्य छावणी उठवून लावण्याचे नियोजन करीत असताना झुल्फीकारखान राजाराम महाराजांना व सरसेनापती धनाजींना जेरबंद करण्यासाठी हालचाली करत होता. "दमरनी-तैमूरनी' म्हणजेच सध्याच्या टेंभुर्णी परिसरात भीमा नदी ओलांडून परतत असताना छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांना ब्रह्मपुरीतील मुगल छावणी उठवून लावण्याचे आदेश दिले. सोबत राणोजी घोरपडे, हणमंतराव, बहिर्जी हे मुख्य पराक्रमी मराठे सरदार होते. धनाजीरावांनी खानापुरातील मुगल ठाण्यावर 23 जानेवारी 1700 रोजी आक्रमण करून खानापूरचा ठाणेदार आवजी आढळा याला कैद केले. त्याला सोडविण्यासाठी झुल्फीकारखान फौजेसह सीना काठालगत ब्रह्मपुरीकडे निघाला; पण पोचायला उशीर झाला व मराठी फौजा पुढच्या टप्प्यात आल्या. या प्रसंगाचे वर्णन औरंगजेबाच्या खासगी दैनंदिनी अखबारात आलेले आहे. त्याच्या मराठी भाषांतरानुसार "झुल्फीकारखानबहादूरनुसरतजंग खजिना व काफीला परांड्याहून ब्रम्हपुरीच्या तळावर आणीत असता, धनाजी जाधव वगैरे मरहठ्ठे सरदार हे दहाहजार स्वार घेऊन "उंदरगाव परगण्यात' चालून आले. चौदा शाबान (तारीख 25 जानेवारी 1700) रोजी उंदरगावात युद्ध झाले'.
रहिमतपूर येथील लढाई 11 जानेवारी 1700, खानापूर येथील लढाई आदी या चकमकींनंतर उंदरगाव येथे झालेल्या लढाईत सरसेनापती धनाजीराव व झुल्फीकारखान पुन्हा आमनेसामने आल्याने धनाजीरावांनी जोरदार हल्ला चढवला. खानासह दाऊदखान, रामसिंग हाडा, राव दलपत बुंदेला हे औरंगजेबाचे सरदार सहभागी असूनही सर्वांना उंदरगावच्या लढाईत पराभव स्वीकारावा लागला. झुल्फीकारखान घाबरून पिछाडीलाच थांबल्यामुळे जिवंत वाचला. झुल्फीकारने मात्र "आपण शंभर मराठे मारून युद्ध जिंकले' अशी खोटी बातमी हेरांमार्फत औरंगजेबला कळविली, परंतु नंतर उंदरगावातील अपमानास्पद पराभवाची खरी हकीकत गुप्तहेरांकडून कळताच औरंगजेबाने मावळ्यांची धास्ती घेत घाबरून ब्रह्मपुरीच्या छावणीभोवतीच फौजफाटा व रसद वाढवण्याचे आदेश दिले. मावळ्यांनी मात्र उंदरगावच्या मातीत झुल्फीकारखानाला पराभूत करीत, छत्रपतींच्या रायगडाला इजा पोचवल्याचा बदला घेतला.
त्याकाळी उंदरगाव हा स्वतंत्र तालुका होता. तेव्हाच्या उंदरगाव तालुक्यात तब्बल 29 ते 31 गावे समाविष्ट असून "इंद्रगाव ऊर्फ उंदरगावपरगणाह' हा 1 लाख 250 रुपये आठ पैसे महसुलासह पूर्ण तालुका बराच काळ तारागढ व सांभर येथील घराण्याच्या दक्षिणेत आलेल्या वारसांपैकी रावप्रतापसिंह चव्हाणसांभरीराव व त्यांच्या मुलांच्या अमलाखाली असून ते शेवटपर्यंत स्वराज्यातर्फे लढले. "मांडवा-मांडोह परगणाह' अर्थात आताच्या माढा तालुक्यात 28 गावे समाविष्ट होती व महसूल 66 हजार 641 रुपये आठ पैसे होता.
माढा व आसपासच्या तालुक्यांतील गावे म्हसवडच्या नागोजी मानेदेशमुखांना छत्रपती राजाराम महाराजांनी 1699 मध्ये देशमुखीत दिली होती. सन 1700 मध्येच मुतालीबखानाने रावप्रतापसिंहांची परांडा इलाख्यातील चकमकीत कपटाने हत्या घडवून आणली. सध्या रावप्रतापसिंहांची तेरावी पिढी उंदरगाव व माढा येथे राहात असून, गावगाड्यातील प्रमुख अधिकारी असलेले प्रमुख मानकरी वतनदार व जमीनदार नाईकवाडी, लवटे, सुतार, म्हस्के आदी नामवंत जमीनदार होते.
या लढाईचा प्रसंग कोरलेल्या सात-आठ वीरगळी उंदरगावात असून त्यावर युद्ध करणारे योद्धे व ते युद्धात मरण पावल्यानंतर त्या योद्ध्यांच्या आत्म्याला स्वर्गात घेऊन जाताना स्वर्गातील दासी व सर्वात शेवटी कैलासात शिवलिंगाची उपासना करताना मरण पावलेल्या योद्ध्याचा आत्मा अशा तीन टप्प्यांत शिल्पपट कोरलेल्या वीरगळ असून, या योद्ध्यांची आठवण पुढील पिढ्यांना राहण्यासाठी वीरगळ कोरण्याची प्रथा प्रचलित होती, जी उंदरगावातील तेव्हाच्या समाजाने 25 जानेवारी 1700 रोजीच्या लढाईनंतर शिल्परूपातून जपल्यामुळेच आज ही शिल्पे सापडली व उंदरगावच्या लढाईचा इतिहास उजेडात आला.
याबाबत माढा-उंदरगावचे इतिहास संशोधक मयूर चव्हाण म्हणतात, सोलापूर जिल्ह्यात औरंगजेब आला व पराभवाच्या अनेक वार्ता त्याने याच जिल्ह्यात ऐकल्या. झुल्फीकारखानाचीही मिजास "उंदरगावच्या लढाईत' धुळीस मिळून "रायगडाच्या अवमानाचा बदला घेणारी युद्धभूमी' अशी उंदरगावची व सीना नदीकाठाची स्वतंत्र ओळख आहे. या ऐतिहासिक घटनेच्या संशोधनासाठी मुगल दरबारचे औरंगजेबकालीन अखबार, मुगलांच्या प्रशासकीय व्यवस्थेवरील शहाजहानकालीन व औरंगजैबकालीन साधने, पत्रव्यवहार आदींचा आधार घेतला असून, तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षकवृंदांनी हा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावा. जिल्ह्यातील अनेक गावांत असणाऱ्या अशा ऐतिहासिक ठेव्याची निगा राखण्यात शासनाने पुढाकार घ्यावा.
माढा गढी/किल्ला (Madha Fort) किल्ल्याची ऊंची : 0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर
जिल्हा हा तिथे असलेले मजबूत भुईकोट किल्ले/गढी यांसाठी ओळखला जातो.
इतिहासातील अनेक नामवंत सरदार पदाधिकारी यांच्या गढया जिल्ह्यात सर्वत्र
पहावयास मिळतात. त्यांचे अवशेष काही प्रमाणात आजही त्यांच्या ऐतिहासिक
पणाची साक्ष देत आहेत.
पहाण्याची ठिकाणे :
सोलापूर
जिल्ह्यातील एक महत्वाचे तालुक्याचे ठिकाण म्हणजे माढा होय. माढा गावातच
मध्यवर्ती ठिकाणी रावरंभा निंबाळकर यांनी बांधलेला एक गढीवजा किल्ला आहे.
गढीचे प्रवेश द्वार आणि तटबंदी सुस्थितीत आहे. नगरपालिकेने
प्रवेशद्वाराच्या दुतर्फा शोभिवंत वृक्षांची लागवड केलेली आहे. गढीला चार
बाजूंना चार गोलाकार बुरूज आहेत. गढी मध्ये प्रवेश केल्यावर उजवीकडे वळून
पायर्यांच्या द्वारे तटबंदीवर तसेच बुरुजावर जाता येते. बुरुजांवर तोफा
ठेवण्यासाठी केलेला मोठा उंचवटा स्पष्टपणे दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी
अंतर्गत बाजूने तटबंदीची पडझड झाल्याने गढीला पूर्ण फेरी तटबंदीवरून मारता
येत नाही. गढीच्या मध्यभागी एका जुन्या मोठ्या बारवेचे दर्शन होते. परंतु
सर्वत्र वाढलेल्या झाडाझुडपांनी या बारवेची रचना नीट लक्षात येत नाही.
तटबंदीच्या खालील बाजूस काही खोल्यांची रचना केलेली दिसून येते. तसेच एक
अर्धा तुटलेला रांजण जमिनीत गाडला गेलेला आहे. गढीच्या बाहेरील बाजूस सध्या
शाळेची इमारत आहे. काही वर्षांपूर्वी ही शाळा गढीमध्ये भरत असे. शाळेच्या
आवारातच अजून एक विहीर अथवा बारव दिसून येते. ती बऱ्याच प्रमाणात बुजलेली
आहे. पूर्ण गढी पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे.
गढी पासून
काही अंतरावरच ग्रामदैवत माढेश्वरी देवीचे जुने मंदिर पाहण्यासारखे आहे.
करमाळ्याच्या कमळाई देवी मंदिरा सारखीच रचना या मंदिराची आहे. पंचायतन
प्रकारातील हे मंदिर प्रशस्त असून सहसा महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये न
दिसणारी गोपूर रचना येथे दिसून येते. प्रवेश द्वाराच्या उजवीकडे जमिनीत
बसवलेली चार बाजूंनी कोरलेली वीरगळ सुस्थितीत आहे.
पोहोचण्याच्या वाटा :
सोलापूर
ते माढा ६५ किलोमीटर अंतर आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी या
गावापासून माढा हे ठिकाण ३५ किलोमीटर अंतरावर आहे. कुर्डूवाडी हे जवळचे
रेल्वे स्थानक माढ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
माढा
प्रकार : गढी
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
पुणे-सोलापूर
रस्त्यावर टेंभूर्णीपासुन ३५ कि.मी.अंतरावर तर कुर्डूवाडीपासून १२ कि.मी.
अंतरावर माढा हे सोलापूरच्या माढा तालुक्याचे गाव आहे. येथील ग्रामदैवत
माढेश्वरी देवीच्या नावावर या गावाचे नाव माढा असे पडले. माढा गावात आजही
सुस्थितीत असा छोटेखानी देखणा भुईकोट आहे. माढा किल्ल्याचे प्रवेशद्वार
उत्तराभिमुख असुन क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे. या किल्ल्याची निर्मिती
रावरंभाजी निंबाळकर यांनी १७१० साली केली. किल्ला आजही रावरंभा निंबाळकर
यांचे नववे वंशज यशवंत आनंदराव निंबाळकर यांच्या ताब्यात असुन किल्ल्याच्या
आतील वास्तुंची पुर्णपणे पडझड झाली आहे. माढेश्वरी मंदिरावरून किल्ल्याकडे
जाताना सर्वप्रथम वेशीवर मारुतीचे मंदिर लागते. मंदिराच्या पुढिल बाजुस एक
भलीमोठी दगडी बांधणीची मोटेची विहीर आहे. या विहिरीच्या शेजारून जाणाऱ्या
वाटेने किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाता येते. किल्ल्याच्या दरवाजासमोरील
मोकळ्या पटांगणात स्वच्छ भारत योजनेला हरताळ फासल्याने नाकाला रुमाल लावत
जपुन पावले टाकत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जावे लागते. समाधानाची एकच
गोष्ट कि गावकरी यासाठी किल्ल्याच्या आतील भागाचा वापर करत नाहीत.
दरवाजातून प्रवेश केल्यावर आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन
समोरच एका चौसोपी वाड्याचे अवशेष दिसतात. वाड्याच्या चौकात दगडी कारंजे
असल्याच्या खुणा दिसुन येतात. दरवाजाच्या वरील भागात कधीकाळी नगारखाना अथवा
मंडप असल्याचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या दरवाजा शेजारील तटबंदी सोडल्यास
पुर्ण किल्ल्याची तटबंदी सुस्थितीत असुन तटबंदीवरून संपुर्ण किल्ल्याला
फेरी मारता येते. किल्ल्याच्या चारही टोकाला चार मोठे बुरूज असुन त्यावर
तोफ ठेवण्याचा उंचवटा दिसुन येतो. या उंचवट्या खाली तोफगोळे ठेवण्यासाठी
कोनाडे बनवले आहेत. तटबंदीवर जाण्यासाठी प्रत्येक बाजुस एक अशी चार ठिकाणी
पायऱ्यांची सोय आहे. किल्ल्याच्या आतील भागातील वास्तू मोठया प्रमाणात पडझड
झाल्याने मातीखाली गाडल्या गेल्या आहेत. गडाच्या संपुर्ण तटबंदीत एकुण सहा
खोल्या बांधलेल्या असुन पश्चिमेकडील तटबंदीत तीन ओवऱ्या व उत्तरेकडील
तटबंदीत दारूगोळ्याचे कोठार आहे. शिवाय कोटाच्या मध्यभागी एक ५०-६० फुट खोल
व ५-६ फुट रुंद अशी एक दगडी बांधीव विहीर असुन या विहिरीचे पाणी संपुर्ण
किल्ल्यात सायफन पद्धतीने म्हणजेच हवेच्या दाबाने फिरवलेले दिसुन येते.
डावीकडच्या तटावर अलीकडेच स्थापन केलेली एक शंकराची पिंड दिसते. दरवाजाच्या
आतील बाजुस उजवीकडे एक भुयार आहे पण त्याचा आतील भाग ढासळल्याने आत शिरता
येत नाही. हे भुयार माढेश्वरी मंदिरात उघडते असे सांगितले जाते. पूर्वी या
किल्ल्यापासून ते माढेश्वरी मंदिरापर्यंत भुयारी रस्ता होता व त्याचा वापर
किल्ल्यावरील स्त्रियांना देवळात येण्यासाठी होत असे असे सांगितले जाते.
मंदिराच्या बाजूने ते भुयार बंद केलेले असुन तेथील एका ओवरीत बंद केलेल्या
दरवाजाच्या बांधकामाच्या खुणा दाखवल्या जातात. किल्ल्याच्या पुर्वेकडील
तटबंदीबाहेर एक खुप मोठी चौकोनी बारव असुन तिच्या आत उतरण्यासाठी पायऱ्या
आहेत. या बारवच्या मागील बाजुस असणाऱ्या तटबंदीत एक लहान दरवाजा दिसुन येतो
पण तो सध्या दगड लावुन बंद करण्यात आला आहे. हा भाग भोवताली छोटीशी तटबंदी
घालुन बंदीस्त करण्यात आला आहे. हे सर्व व संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास
पुरेसा होतो. शिवाजी महाराजांचे जावई महादजी निंबाळकर यांच्या
दासीपुत्राचा मुलगा रंभाजी निंबाळकर यांना १७०७ मध्ये माढ्याची जहागिरी
मिळाली. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार रावरंभा निंबाळकर यांची राजगादी इथे
होती व नंतरच्या काळात ती करमाळा येथे नेण्यात आली. माढा किल्ला हा १७१०
साली रंभाजी निंबाळकर यांनी बांधला. छत्रपती संभाजी महाराजांच्या
मृत्यूनंतर रंभाजी निंबाळकर आणि चंद्रसेन जाधव यांनी मुघलांची चाकरी
पत्करली. १७०७ साली झालेल्या पुरंदरच्या लढाईत रंभाजीने मुघलांकडून लढताना
बाळाजी विश्वनाथ आणि हैबतराव निंबाळकर याचा पराभव केला आणि
निजाम-उल-मुल्कने त्यांना राव अशी पदवी दिली. १७व्या शतकात काहीकाळ रावरंभा
निंबाळकरांकडे पुणे सुभ्याची जहागिरी होती असे सांगितले जाते. खर्डा येथील
१७९५ च्या मराठे आणि निजाम यांच्यातील लढाईत रावरंभा निंबाळकर यांनी
पराक्रम करून निजामाला वाचवले.
© Suresh Nimbalkar
माढ्याचे विठ्ठल मंदिर आणि मूळ मूर्तीचा वाद
पंढरपुरातील
विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातील? या डॉ.रा.चिं. ढेरे
यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला, पण खऱ्या विठ्ठलभक्ताला
त्या वादात रस नाही. त्याच्यासाठी तो विठुराया फक्त देव नाही, तर मित्रही
आहे. तो ‘प्रथम भेटी आलिंगन, मग वंदावे चरण’ या अभंगाप्रमाणे कायमच त्या
मित्राची मनोमन गळाभेट घेत आला आहे. आणि ही गळाभेट जरी पंढरीला प्रत्यक्षात
घेता येत नसली तरी माढ्याला मनसोक्त घेता येते, हे मात्र नक्की!
माढ्यातील विठ्ठलमंदिर फारसे गजबजलेले नाही; अगदी ऐंशीमधील ‘त्या’ वादानंतरही नाही. अगदी ते मंदिर त्याला मंदिर म्हणावे असेही नाही. धड घुमट नाही, की कळस नाही. त्याच्या चार बाजूंना मशिदीच्या मिनारासारखे बांधकाम आहे. पण मंदिरातील विठ्ठलमूर्ती प्राचीन, थेट पंढरपूरच्या विठ्ठलाशी नाते सांगणारी भासते -एकाकी, रेखीव, गूढ आणि तरीही रम्य…
सकाळचे सहा-साडेसहा वाजलेले असतात. माढ्यातील त्या विठ्ठल मंदिरात एकट्या पुजाऱ्याशिवाय दुसरे कोणीही नाही. हळू आवाजात सुरू असलेला मंत्रोच्चारही आसपासच्या नीरव शांततेमुळे देऊळभर भरून राहिलेला. नुकत्याच संपलेल्या अभिषेकामुळे विठ्ठलाचे सावळेपण अधिकच उजळलेले. तेवढ्यात एक वयोवृद्ध बाई देवळात येते. थेट गाभाऱ्यात शिरते. विठ्ठलाच्या तोंडाला साखरेची वाटी लावते. लहान मुलाची दृष्ट काढावी तशी ती विठ्ठलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बोटे उलटी करून स्वत:च्या कानशीलाजवळ कडकन मोडते… तिला त्या सावळ्या ध्यानात काय दिसले ठाऊक नाही, पण तो देव तिला सोवळ्याओवळ्याच्या पलीकडला वाटतो. आपल्या पोटच्या मुलासारखा. आईच्या मायेला मुलाहून अधिक जवळ ते काय. विठ्ठलाला पाहून त्या माऊलीला वात्सल्याचा पान्हा फुटावा यातच त्या देवाचे मोठेपण सामावलेले आहे.
कंठात गहिवर दाटून यावा असा तो प्रसंग समोर घडत असताना, ती बाई जे बोलली ते भल्याभल्या विचारवंतांनाही तोंडात बोटे घालायला लावेल असं. देवाची दृष्ट काढून ती माऊली आकाशाकडे हात करत बोलती झाली. ”हे ईठ्ठला, काय बी नको बघ तुज्याकडून, आता जसा भेटतोस तसाच रोज भेट म्हणजे झालं”. ‘हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा’ म्हणणारे तुकोबा याहून वेगळे काय म्हणत होते.
माढा. वीस-पंचवीस हजार वस्तीचे हे सोलापूर जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण. पण कुर्डुवाडीला रेल्वेचे जंक्शन झाले आणि माढ्याचे महत्त्व ओसरले. पण निंबाळकरांची जहागिरी असणाऱ्या माढ्यातील हे विठ्ठलमंदिर रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनाने अचानक प्रकाशात आले. ढेरे यांनी अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण देत हे मांडले आहे, की पंढरपुरात असलेली विठ्ठलमूर्ती ही मूळ यादवकालीन मूर्ती नाही. पण मूळ मूर्तीर्ची जी लक्षणे सांगितली जातात तशी मूर्ती माढ्यात सापडते.
त्यांचे हे संशोधन प्रसिद्ध झाल्यावर एकच वादळ उठले. पंढरपूरच्या बडव्यांपासून अनेक भक्तमहात्म्यांनी त्या संशोधनाला विरोध केला. पुजाऱ्यांनी त्यांच्या पोथ्यांवरील धूळ झटकली, संशोधकांनी त्यांचे ग्रंथ पुन्हा एकदा बाहेर काढले. लेखावर लेख असा बौद्धिक वाद सुरू झाला. अनेक वर्षे सुरू असलेला तो वाद कालांतराने शांत झाला. पण विठ्ठलाच्या मूर्तीसमोर त्याच्याप्रमाणेच कंबरेवर हात घेऊन उभे राहिलेले प्रश्नचिन्ह कायम आहे.
स्कंदपुराणातील ‘पांडुरंगमहात्म्य’ या संस्कृत रचनेपासून ते संत सावता माळी यांच्या अभंगापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठलाचे जे वर्णन सापडते, तशी मूर्ती पंढरपुरात नाही. हृदयस्थानावर कोरलेला कुटमंत्र हे त्या मूर्तीर्चे महत्त्वाचे वर्णन आहे. तशी मूर्ती माढा येथे आहे.
मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. ही मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे. ही सारी लक्षणे माढा येथील मूर्तीत पाहता येतात.
श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा: || श्री
वत्स
असा हा कुटमंत्र माढ्याच्या विठ्ठलाच्या छातीवर कोरलेला स्पष्टपणे पाहता येतो.
अफझलखानाने १६५९ मध्ये केलेल्या आक्रमणाच्या वेळी पंढरपूरची मूर्ती माढा येथे हलवली होती, अशीही पारंपरिक माहिती आहे. त्या साऱ्याचे शास्त्रीय विवेचन करत रा. चिं. ढेरे यांनी असे मांडले, की माढा येथील मूर्ती आद्यमूर्तीशी साम्य सांगते. पण अशीही शक्यता आहे, की माढ्यात पंढरपूरचा विठ्ठल येऊन गेला म्हणून माढावासीयांनी त्याची प्रतिमूर्ती स्थापन केली असेल.
ढेरे हे स्पष्ट करतात, की त्यामुळे पंढरपूरचे स्थानमहात्म्य कमी होत नाही, कारण भारतीय धर्मशास्त्रानुसार महत्त्व मूर्तीला नसून स्थानाला आहे, म्हणूनच काशीचा विश्वनाथ किंवा सौराष्ट्राच्या सोमनाथाची मूळ शिवलिंगे अस्तित्वात नसूनही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. हे वास्तव लक्षात घेऊन प्रत्येक पांडुरंगभक्ताने या संशोधनाकडे पाहिले पाहिजे. केवळ आणि केवळ अभ्यासातून पुढे आलेले सत्य मांडण्याचा ढेरे यांचा प्रयत्न आहे. त्यावर जर कोणी पुन्हा अभ्यास केला आणि त्याला वेगळे काही सापडले तर ते जाहीरपणे स्वीकारण्याची कबुलीही ढेरे त्यांच्या त्या संशोधन लेखात देतात.
ढेरे यांच्या संशोधनावर बरीच राळ उठली. काही धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. ‘विठ्ठलभक्तांच्या भावना दुखावणारे संशोधन’ अशी त्यावर टीका झाली. काहींनी तर त्यावर आक्षेपही नोंदवले. त्यात अशा पद्धतीने मूर्तीवर मंत्र असणे हे वैदिक नाही. तसेच, स्कंदपुराणावरच शंका व्यक्त करण्यात आली. त्याव्यतिरीक्त मूर्तीच्या विविध बाजूंवरही आक्षेप घेण्यात आले. पण ढेरे यांनी या त्यांच्या लेखांमधून आणि ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथामधून उत्तरही दिले आहे. पण तरीही आद्यमूर्तीचा वाद भावनांच्या वादळात हरवून गेला. तो ठोस उत्तरापर्यंत आला नाही हेच खरे.
वादाला सत्तावीस वर्षे उलटून गेली आहेत. ढेरेही वयोमानाने थकले आहेत. त्यांनी केलेले संशोधन अनेक अभ्यासकांना आणि जिज्ञासूंना एका नव्या वाटेकडे बोट दाखवत उभे आहे, पण त्यांची परंपरा कायम ठेवत सत्याचा शोध घेणारे ते संशोधन पुढे चालू आहे असे ठोसपणे दिसत नाही. ‘त्या’ वादानंतर चंदभागेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. संशोधनाची माध्यमे बदलली आहेत, विज्ञान पुढे गेले आहे. नव्या साधनांचा उपयोग करून सत्यान्वेषी संशोधनाची पालखी नव्या खांद्यांवर विसावायला हवी.
वादात आणखी एक मुद्दा माढ्यातील देवळाचे पुजारी उत्कर्ष कुंभेजकर मांडतात. ते म्हणतात, की पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या आणि रुख्मिणीमातीच्या दगडात फरक जाणवतो. पण पंढरपूरच्या रुख्मिणीमातेचा दगड आणि माढ्यातील विठ्ठलमूर्तीचा दगड सारखा वाटतो. कदाचित ते शिल्पकलेच्या अभ्यासकांना स्पष्टपणे मांडता येईल. त्या दिशेने अधिक अभ्यास व्हायला हवा.
कारण कितीही अप्रिय असली तरी ‘सत्याची कास’ धरणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अशा वादांना न डगमगता महाराष्ट्राने अनेकदा कटू सत्य मांडले आहे, पचवली आहे. म्हणूनच ‘सन्याशाचे पोर’ म्हणून वाळीत टाकलेले ज्ञानेश्वर येथे ‘माऊली’ ठरतात आणि इंद्रायणीत पोथ्या बुडवूनही तुकाराम ‘जगद्गुरू’ म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच ‘ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे’ म्हणणाऱ्या मराठी मनाने तरी विठ्ठलाचा हा अभ्यास अखंड सुरू ठेवायला हवा.
अखेर, देव हा मूर्तीत नाही हे वारकऱ्यांच्या भागवतधर्माचे सार आहे. म्हणूनच दगडाच्या त्या मूर्तीपेक्षा माणसातील देव भागवतधर्मात मोठा मानला गेला आहे. हजारो मैल चालून वारकरी जो पंढरीला जातो त्याला विठ्ठलाची मूर्ती दिसावी ही आस नसते. त्याला आस असते ती पंढरीला जाण्याची, त्या प्रवासाची. कारण त्या वारीतील समाजजीवन त्याला समृद्ध करणारे असते. त्याच्यासाठी देवदर्शन ही फक्त औपचारिकता असते. ते प्रत्यक्षात झाले नाही तरी तो कळसाचे दर्शन घेऊन माघारी परततो. कारण त्याच्यासाठी विठ्ठल त्या दगडाच्या मूर्तीत नसून एकमेकांच्या अंतरात आहे. म्हणूनच एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटतो, तेव्हा त्याच्या पाया पडतो. माणसातच देव मानण्याची ती प्रथा मूर्तीचे गौणत्व स्पष्ट करत नाही का?
असे असताना, इतिहासाच्या पुराव्यावर विठ्ठल या देवतेचा अभ्यास करणे चुकीचे कसे ठरते? शेवटी, दैवते माणसाने माणसाच्या विकासासाठी घडवली आहेत. श्रीविठ्ठल हा तर मराठी भाषकांनी घडवलेला देव आहे. गेली आठशे वर्ष तो मराठी भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे. ज्ञानेश्वरांपासून चोखा महारांपर्यंतचे त्याचे भक्त त्याच्या सर्वसमावेशकतेची साक्ष देत उभे आहेत. फक्त जातीपातींच्या भिंतीच नाहीत तर भारतातील शैववैष्णवांच्या वादावर पडदा टाकत ‘विष्णुसहित शिव’ म्हणून तो चंद्रभागेच्या काठी उभा ठाकतो. एकंदरीत विविध ज्ञानप्रज्ञांच्या प्रवाहांचा हा महासमन्वय फक्त भक्तांना नाही तर अभ्यासकांनाही कायम खुणावत राहिला आहे.
त्याचा अभ्यास फक्त मराठीजनांनी नाही तर भारतातील विविध भाषांमध्ये आणि अनेक विदेशी संशोधकांनी केला आहे, करत आहेत. तो मूळचा गवळी-धनगरांचा लोकदेव अवघ्या मराठी मनाची विठुमाऊली झाला. त्याला कधी सोवळ्याओवळ्याचे बंधन नव्हते, ना शोडषोपचाराची गरज. त्याच्या पूजेत ते सारे असले तरी ते मुळचे नाही. कारण ज्ञानेश्वरांपासून चोखोबांपर्यंतच्या संतांनी त्याच्या ओव्या गायल्या आहेत आणि त्याला शिव्याही घातल्या आहेत. ‘आहे असा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।। ‘ असे सांगत तुकारामांनी तर माणसातील देवापुढे या दगडाच्या देवाचे अस्तित्वच नाकारले आहे.
वारकरी संप्रदायाने मानलेल्या माणसाच्या देवत्त्वाची साक्ष माढ्यातील एका अनुभवात आली. पंढरीच्या वाटेवर असलेल्या माढ्यातील विठ्ठलाची ज्याला माहिती आहे. ते वाट वाकडी करून त्या देवळापर्यंत पोचतात. त्या दिवशी दुपारी असेच काही वारकरी देवळात आले होते. त्यातील एकाने हातातील दुधाची वाटी विठ्ठलमूर्तीपुढे ठेवली आणि मनोमन हात जोडले. त्यानंतर ती वाटी देवळातच वावरणाऱ्या एका लहानग्याच्या हातात ठेवून त्याने त्या मुलाच्या पायावर डोके ठेवले. अशा नमस्कारांना सरावला असल्यामुळे असेल कदाचित पण त्या मुलानेही त्या काकांना नमस्कार केला. उगी दगडाच्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा माणसाच्या अंतरीचा पांडुरंग सुखावण्याची त्याची ती कृती खूप काही शिकवून गेली.
त्या वारकऱ्यासाठी ती मूर्ती मूळमूर्ती आहे का नाही याच्याशी काहीच घेणेदेणे नव्हते. त्याला पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या त्या दुसऱ्या विठ्ठलाला भेटावेसे वाटले आणि तो आला एवढेच. तीच भावना घेऊन माढ्यातून परतायची वेळ झाली होती. ज्या पावलांची पूजा जन्मभर घडावी असे मागणे संतांपासून सर्वांनी मागितले, त्या पावलांवर डोके ठेवले. त्या क्षणी मनात आले, की कदाचित याच पावलांवर ज्ञानदेव, नामदेव, मुक्ताईपासून तुकाराम, निळोबांपर्यंतच्या संतांनी डोके ठेवले असेल. माणसाला जगायला याहून आणखी काय प्रेरणा हवी?
– नीलेश बने
(मूळ लेख ‘महाराष्ट्र टाईम्स’, 13 जुलै 2008)
About Post Author
नीलेश बने
नीलेश बने हे सध्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये
‘रिसर्च फेलो’ म्हणून काम करत आहेत. त्याआधी बारा वर्षांहून अधिक काळ
त्यांनी मुद्रित आणि ऑनलाइन माध्यमांमधून पत्रकारिता केली. ‘महाराष्ट्र
टाइम्स डॉट कॉम’ या मराठीतील आघाडीच्या वेबसाइटच्या संपादकीय विभागाचे ते
प्रमुख होते. ‘इंटरनेट माध्यमामुळे बदलत असणारा लोकसंवाद’ हा त्यांचा
अभ्यासाचा विषय आहे. वारकरी संताचे कार्य ही त्यांची प्रेरणा असून
यासंदर्भात त्यांनी लेखनही केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9892745685
कोणता मानू मी विठठल ?
महाराष्ट्राचं लोकदैवत पंढरपूरचा पांडुरंग अनेकांचा श्रद्धेचा विषय. पंढरपूरचा पांडूरंग सर्वसामान्यांचा देव. गरिबांना पावणारा. भक्ताच्या रक्षणासाठी धावत येणारा. असा महिमा महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या मनात दडून बसलेला आहे. पंढरपूरचा हा विठोबा वारक-यांचा देव आणि वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा पंथ. निमंत्रणाशिवाया लाखोंची 'पाऊले पंढरीची वाटं चालतात हे एक आश्चर्यच आहे. अशा या पांडुरंगाच्या भेटीचे योग जुळुन येणार होते. पंढरपूरला पूर्वी पंडरंगे, पांडरंगपल्ली, माढा येथील विठोबाचे मंदिरपौंडरीकक्षेत्रे, पंडरीपूर, पांडुरंगपूर अशा नावाने ओळखल्या जात होते. विठोबाची मूर्ती पंढरपूरात केव्हापासून आहे हे नेमके सांगता येणार नाही.
युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
अशा लोकभावनेचा मी आदर करतो पण ते काही खरे वाटत नाही. संत ज्ञानदेव आणि नामदेव यांच्या भेटीनंतर पंढरपूर क्षेत्रातील पांडुरंग दर्शनाचे महत्त्व वाढले. जातीभेद कर्मकांडाच्या पुढे जाऊन सर्व वारकरी आणि भक्तमंडळींची अराध्य दैवताची पुजा आठशे नऊशे वर्षापासून चालूच आहे. असे असले तरी अनेक आवडत्या नावडत्या गोष्टी पंढरीत घडल्या आहेत. पांडुरंगाचे दर्शन सर्वसामान्यासाठी खुले झाले तेव्हा पांडुरंगाचा आत्मा एका माठात काढून ठेवल्याने आता मुर्तीत देवत्व राहिले नाही अशा घटनेने माझी असलेली श्रद्धा डळमळीत होते. असो, या सर्व गोष्टी सांगण्याचा उद्देश असा की या पंढरीरायाचे दर्शन व्हावे म्हणून मी पहिल्यांदाच जाण्याचे ठरविले. पण थेट प्रचलित पंढरपूरचे पांडुरंगाच्या दर्शनाऐवजी वाट जरा वाकडी केली आणि मागे एकदा एका उपक्रमावरील विठोबा कोणता खरा ? चर्चेवरुन माढ्याचा विठ्ठल मूळ विठ्ठलाची मूर्ती कोणती त्याबद्दल मला ओढ होती. म्हणून मी पंढरपूरला न जाता थेट माढ्याला पोहचलो. मूळ मूर्तीची गोष्ट सांगण्यापूर्वी इतिहासातील मूर्तीसंबंधातील काही संदर्भांची तोंडओळख करुन देतो.
विठ्ठल मुर्तीचे अनेक वेळा अनेक कारणाने स्थलांतर झाल्याचे इतिहासात नमुद केलेले आहे. औरंगजेब जेव्हा माढ्याचा
विठ्ठल...ब्रह्मगिरीपर्यंत हिंदुची एकेक देवळे फोडत आला तेव्हा बडव्यांनी
विठ्ठलमुर्तीला देगावला एका देशमुखाकडे हलविले त्याने ती मुर्ती विहिरीत
लपविली होती. पुढे आक्रमण परतल्यावर ती मुर्ती पुन्हा पंढरपुरवासियांच्या
विनंतीवरुन पंढरपूरला आणन्यात आली. चिंचोली, गुळसरे, अशा गावीही ती मूर्ती
हलविल्या गेली आहे. '' एकदा तर एका बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून नेऊन
आणि लपवून ठेवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली
होती.'' सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठ्ठलमूर्ती
आपल्या राज्यात नेली. भव्य मंदिर बांधून त्यात विठ्ठलमुर्तीची स्थापनाही
केली. पुढे वारीला जेव्हा संतमंडळी आली तेव्हा त्यांना मुर्ती दिसली नाही
त्यांच्याबरोबर भक्तमंडळीही व्याकूळ झाली आणि या भक्तजनांनी
एकनाथमहाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांना मूर्ती परत आनण्याची विनवणी
केली. भानुदास महाराजांनी कृष्णदेवरायांचे मन पूरिवर्त्न करुन विठलमूर्ती
परत आणली. पुढे ''अफजलखानाच्या हाती मुर्ती येणार होती त्यापूर्वीच
बडव्यांनी पंढरपूरहून वीस मैल असलेल्या 'माढा' या गावी [जि.सोलापूर] येथे
नेऊन ठेवली. वर ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र
देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. पुढे ती मूर्ती पंढरपूरला आणल्या गेली का ?
पंढरपूरातली पांडुरंगाची मूर्ती ती आद्य मूर्ती का ? या विषयावर श्री
रा.चि.ढेरे यांनी श्री विठ्ठल एक महासमन्व्यक हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले
आहे त्यात ते अनेक संदर्भ ग्रंथावरुन त्यांनी माढ्याची विठ्ठलाची मूर्ती
ही आद्य मूर्ती ठरवली आहे. त्यांचे केसरी मधील दोन लेखांनी [वर्ष १९८२]
महाराष्ट्रभर वैचारिक धुमाकूळ घातला होता असे म्हणतात.
श्री रा. चि. ढेरे यांनी या विषयावर मोठे संशोधन केलेले आहे आणि ते मला पटणारे आहे. त्या विषयी इथे अधिक काही टंकत नाही. विठ्ठलतेच्या अचूक निरीक्षणावरुन मूळ मूर्ती माढ्यालाच आहे असे त्यांचे म्हणने आहे. पायातले तोडेतर मूर्ती विठ्ठमूर्ती माढ्याला हलविली गेली. त्या विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी मी माढ्याला पोहचलो. सावता माळ्याच्या अप्रकाशित अभंगातील दाखला त्या मूर्तीबाबत दिल्या जातो. तो अभंग असा-
विठ्ठलाचे रूप अतर्क्य विशाळ । -दयकमळ मंत्रसिद्ध ॥
दिगंबर मूर्ती गोजरी सांवळी । तोडे पायी वाळी मनगटी ॥
कटीवर हात, हाती पद्म शंख । पुष्पकळी मोख अंगुलीत ॥
सावता माळी म्हणे शब्दब्रह्म । नाम विठ्ठलाचे कलियुगीं ॥
सावता माळ्याला [महाराजांना ] जसे रुप दिसले तसे त्यांनी वर्णन केले
आहे. विठ्ठल कसा आहे तर दिगंबर आहे. वर्ण सावळा आहे. त्याच्या पायात तोडे
आहेत. दोन्ही हात कमरेवर आहेत. या सर्व मंत्राक्षरवर्णनापेक्षा
दिगंबरत्व ह्या मुद्याकडे श्री. रा.चि. ढेरे आपले लक्ष वेधतात. मस्तकावर
गवळी टोपी. दोन्ही कानात शंखाकार कुंडले. गळ्यात कौस्तुभमणी, डाव्या हातात
शंख. उजव्या हाताच्या तळवा काठीवर टेकवलेला. मनगटावर कडे. आणि विठ्ठलाच्या
वक्ष:स्थळावर मंत्राक्षर आपल्याला दिसतात.
'' श्री स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं
षणषटु सदीर्घकं || ष
टषटू दिनंत्यंतं स
सारं तं विदर्बु
धा: || श्री
वत्स'' [पृ.क्र. १२९]
प्रचलित पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीत अशी कोणतीही ओळख दिसत नाही. माढे येथील मूर्ती खडबडीत नाही. सध्याची पंढरपूर येथील पांडुरंग मूर्ती खडबडीत वाटते. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या अभिषकामुळे त्याची झीज झाली असावी असाही मुद्दा रेटता येतो. पण ज्या शिळेपासून माढ्याचा विठ्ठल घडलेला दिसतो त्याच शिळेपासून रुक्मिणी घडलेली दिसते. आणि श्री. रा.चि. ढेरे ज्या ''पांडुरंगमाहात्म्य'' चा संदर्भ देतात आणि आद्य मूर्तीची जी लक्षणे सांगतात ती अशी
''१) मूर्तीच्या -हदयावर देवाचा नाममंत्र कूटश्लोकात कोरलेला आहे.
२) मूर्तीच्या भाळावर तृतीय नेत्र आहे. आणि-
३) मूर्ती दिगंबर बालगोपालाची आहे'' [पृ.क्र.१३९]
ही तिन्ही लक्षणे आजच्या पंढरपूर मूर्तीत नाही. ती सर्व लक्षणे माढ्याच्या मूर्तीत दिसतात. या सर्व लक्षणावरुन मलाही ती मूर्तीच मूळ वाट्ली. अर्थात, मंदिरातल्या देव वगैरे अशा गोष्टींवर माझा विश्वास नसला तरी क्षणाक्षणाला असंख्य अद्बुत चमत्कार घडणा-या या सृष्टीत एखादी शक्ती कार्यरत असावी यावर विश्वास आहे. असो, तो विषय वेगळा. श्री.रा.चि.ढेरे म्हणतात ''मूर्तीद्रव्य हे भंगुर आणि जंगम असल्यामुळे त्याच्या बदलामुळे देवत्वाची आणि देवत्त्वाशी संबंध झालेल्या क्षेत्राची प्रतिष्ठा कधीच उणावत नसते. केवळ मूर्तीच्या बदलामुळे किंवा मूर्त्तीवर संकट आल्यामुळे स्थानमहिमा उणावत नाही ”त्यामुळे कोणाची श्रद्धा दुखावण्याचे मलाही कारण नाही. फक्त आपण कधी माढ्याला गेलात तर याही विठ्ठल मूर्तीची आणि आपली भेट व्हावी त्यासाठी हा प्रपंच. असो, पुढे चंद्रभागेला नमस्कार करुन पंढरपूर येथील प्रचलित पांडुरंगाचेही दर्शन घेतले. पण कोणता मानू मी विठ्ठल; पंढरपूरचा की माढ्याचा ? हा प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहिला.
अधिक संदर्भासाठी जिज्ञासूंनी ''श्रीविठ्ठल एक महासमन्व्यक. लेखक. श्री रामचंद्र चिंतामण ढेरे. श्री विद्या प्रकाशन, 250 शनिवार पेठ, पुणे ४११०३०” हे वाचावे. त्यातील ''आद्य मूर्तीचा शोध'' हे प्रकरण वरील विषयावर आहे.
चेहरा गोल नाही. निमुळता आहे.
माढा येथील मूर्तीचे छायाचित्र वर एका प्रतिसादात बिरुटे सरांनी दिलेलेच आहे.
काही दक्षिणी पद्धतीचे मुकूट येथे पहा. अर्थात हे मात्र सालंकृत आहेत.

मूर्ती प्रत्यक्षात पहिली नाही (मुकुट नसताना) परंतु भक्त आणि वारकरी विठ्ठलाने डोक्यावर शिवलिंग धारण केले आहे असे मानतात. विठ्ठल जर शैव-वैष्णव समन्वयाचे प्रतिक असेल तर डोक्यावर शिवलिंग असावे.१७ व्या शतकात चंद्रभागेमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मिळाली होती त्यातील विठ्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग स्पष्ट कोरले होते.त्या मुर्तीही पंढरपुरात आहेत असे ऐकून आहे.
-दिलीप बिरुटे
स्कंद
पुराण आणि पदमपुराणाशिवाय विष्णुपुराणांतर्गत तिसरे माहात्म्य डॉ ढेरे
याना उपलब्ध झाले होते पण त्यात गूढ मंत्राचा श्लोक आहे कि नाही याबाबत ते
खुलासा करत नाहीत. या माहात्म्याबद्दल संशय वाटण्याचे कारण म्हणजे ही
माहात्म्ये लोकजीवनात मूर्ती प्रसिद्ध पावल्यानंतर लिहिली गेली असल्याचा
संभव असून त्यांना प्राचीनत्व प्राप्त होण्यासाठी पुराणांचा साज चढविला
गेला आहे. सत्यनारयणा पोथोला जसे ' स्कंदपुराणे रेवाखंडे' या शादप्रयोगाने
प्राचीनत्व देण्याचा प्रयत्न झाला आहे. म्हणून या माहात्म्यांची
विश्वसनीयता व प्राचीनता कितपत मानायची याचा संशोधकांनी विचार केला पाहिजे.
शिवाय पुराणांच्या प्रतीमध्ये एकवाक्यता
नाही. वेळोवेळी त्यात भर घालण्यात आलेली दिसते. त्यामुळं मूळ थी कोणती व
त्य।त कसेकसे बदल होत गेले याचे संशोधनझाल्याशिवाय माहात्म्ये संशोधनाचे
साधन होऊ शकणार नाहीत.
डॉ. ढेरे यांच्या मते आद्य विठ्ठलमूर्ती चे अनन्य साधारण वैशिष्ठ्य
म्हणजे त्यावर कोरलेला नाममंत्र कूटलोक होय परंतू आपण हे पाहिले आहे को, ही
दोनही माहात्म्ये ऐतिहासिक दृष्ट्या विश्वसनीय वाटत माहीत. त्यापेक्षाही
अधिक विश्वसनीय मूर्तीचे लक्षण. म्हणजे संतानी वर्णंत केलेले विठ्ठलमूतिचे
स्वरूप हे होय. विठलाच्या मूर्तीवर जर मंत्राक्षरमाला असती तर संतानी
त्याचा उल्ळेख केला असता. विठ्ठलाचे नित्य दर्शन घणारे, पंढरपूरात स्थायिक
असणारे, व मूर्तीचे संपूर्ण दर्शन होण्याची सहजशक्यता असलेल्या, संताच्या
वर्णनात मंत्राक्षरमालेचा लवमात्र उल्लेख नाही. यांने स्पष्टीकरण करण्याचे
उत्तरदायित्व डॉ. ढेरे यांना मुळीच टाळता येणार नाही. भक्त- सम्राट नामदेव
महाराज, संत जनाबाई, शिवकल्याण यासारच्या पंढरपुरवासीय व नित्य दक्षंन
घेणार्या संतांच्या वर्णनात मंत्राक्षर मालेचा उल्लेख नसणे हे आश्चर्य
कारक वाटते. त्यामुळ अश्या तर्हेची मंत्राक्षरमाला या प्राचीन मूर्तीवर
नसावी असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. आद्यमूर्तीच्या वर्णनात संतांचे
शब्द
विश्वसनीय का? ज्यांच्या विश्वसनीयतेबद्दल शंका आहे अशा माहात्म्याची
वणंने प्रमाण मानावयाची याच्याबद्दल फारसा संदेह बाळगण्याचे कारण नाही.
संतांची वर्णने अधिकृत समजावयास कोणतीच हरकत वाटत नाही. अर्थात ज्यांना
प्राचीन मूर्तीच्या अनन्य साधारण वेशिष्ठ्याचा डोलारा उभा करावयाचा आहे
त्यांना मात्र ही वर्णने नि:संशय अडचणीत टाकणारी आहेत.
आपल्या सिद्धांताला अन्य रचनांची पृष्टी म्हणन जी इतर साधने 'विठ्ठलसहस्रनाम स्तोत्र' ' विठठल अष्टोत्तर शतनाम स्तोत्र' डॉ. ढेरे घेतात त्या साधनांच्या प्राचीनतेबद्दल ते स्वतः साशंक आहेत आणि त्यांचे कारणही ते मान्य करतात. अशा कृतींचा “ रचना हेतूच मळी पावित्र्य व प्राचीनता वाढवून सांगण्याचा असतो आणि त्यासाठी त्यांचा कर्ता आपले नांव पुसून टाकोत असतो.” डॉ. ढेरे यांचा हा मुद्दा अगदी बरोबर आहे
गोरोबा कुंभाराचा काळ,( त्याने पांडुरंगाला विटेवर वेटिंग ठेवले. खूप वेळ. कंटाळून पांडुरंगाने हात कटीवर ठेवले. "अरे लवकर बाहेर ये, रुक्मिणी वाट पाहातेय.") अल्लदीन खिलजी वारंगळपर्यंत ( आन्ध्रा) देवळे फोडत गेला तो काळ, त्या भीतीने महाराष्ट्रात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागात मूर्ती हलवण्याची क्लपना आली असावी. गुराख्यांचा कापडी टोपी घातलेला देव होता.
https://www.misalpav.com/node/13747
पंढरपूरचा विठोबा तेव्हा खोटा ठरला होता, ( माढा,सोलापूर येथील विठोबा खरा की पंढरपूर येथील विठोबा खरा) याबाबत पंढरीनाथ सावंत यांचा दि.२२ जुलै मार्मिक च्या अंकातील एका लेखात त्यांचा एका इतिहास तज्ञाशी वाद होऊन ते या निष्कर्षावर आले की,विठोबाच्या पावलांवर एक हजार वर्षापासून भक्तमंडळी,वारकरी,डोकी घासतात,नारळ ठेवतात.अभिषेकांच पाणी माउलीच्या पायावर जातं,त्यात दही असते,त्यामुळे विठोबाची पावलं झिजून पार नाहीशी झालीत.आणि तीच खरी जी सध्याची पंढरपूरची विठ्ठल मूर्ती आहे.ती खरी मानली पाहिजे.एखाद्या प्रश्नाच्या उत्तराने,ते उत्तर कितीही समाधानकारक असले तरी, समाधानी होईल तो उपक्रमी कसा ?आमचंही काही समाधान झालं नाही.म्हणून तो प्रश्न घेऊन आम्ही उपक्रमाच्या दरबारात हजर झालो." बेदरच्या बादशहाने,विठ्ठलाचे मंदिर उद्ध्वस्त केले,येथील मूर्ती विजयनगरला हालविण्यात आली.एवढेच नव्हे तर त्या जागेवर मशीद सुद्धा उभारण्यात आली होती." आणि पुढे चांगा केशव नावाच्या महाराने मंदिर उभे करण्यासाठी मदत मिळवली आणि ते मंदिर पुन्हा उभे राहिले.आमच्या वाचनात असेही आहे की,भानुदास महाराजांनीही ही मूर्ती कुठूनतरी पंढरपुरास आणलेली होती. (चू.भू.दे.घे.) असो, अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा असलेल्या,पांडुरंगाच्या स्थळ काळाची अदला,बदल होऊ शकते. किंवा नसेलही झाले. उपक्रमी काय म्हणतात ?
अवांतर : ) देवशयनी आषाढी एकादशी पर्यंत हा विषय संपवावा,कारण त्या माउलीला आपल्याला फार मागणे मागायचे आहे,अर्थात न मागता देता तो देव असे म्हणतात.पण तरीही, आमचे उपक्रमी सुखात राहू दे,पाहिजे तिथे बक्कळ पाऊस होऊ दे.आणि येत्या वर्षात उपक्रमाच्या ध्येय-धोरणात शिथिलता येऊन इथे पुढच्या वर्षापर्यंत,कविता,ललित लेखनही दिसू दे. बोला "पुंडलिक गवरदे हारी विठठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय !
डॉ. रा.चिं ढेरे यांचा लेख खूप वर्षांपूर्वी वाचला होता. त्यातील एकच गोष्ट स्मरते.त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नामदेव,तुकाराम. रामदास इ.संतांच्या अभंगांत विठ्ठल मूर्तीचे जे वर्णन आहे ते माढा येथील मूर्तीशी जुळते.पंढरपूरच्या मूर्तीशी नाही. रामदास हे काही विठ्ठ्ल भक्त नव्हेत. पण ते एकदा पंढरपूरला गेले होते. त्यांच्या एका रचनेत आहे:
अर्थ असा की विठ्ठलाने ज्याला डोक्यावर घेतले त्या महादेवाच्या तोंडी ज्याचे नाव त्याला (रामाला ) ओळखा.(श्रीशंकर रामनामाचा जप करतात असे मानले जाते. रामरक्षेतही तसे आहे.) माढा येथील विठ्ठल मूर्तीच्या शिरावर शिवलिंग आहे. तोच रामदासांच्या वर्णनातील 'देवराणा'. असे डॉ.ढेरे यांचे म्हणणे आहे. आणखी काही पुरावे त्यांनी दिले आहेत पण आता आठवत नाहीत.
http://mr.upakram.org/node/577
माढ्यातील ऐतिहासिक विठ्ठल मंदिर

माढा; मदन चवरे : संतश्रेष्ठ सावता माळी यांच्या अभंगात वर्णिलेल्या आणि स्कंद आणि पद्म पुराणातील आद्य मूर्तीची लक्षणे दाखविणार्या माढा शहरातील कसबा पेठेतील विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती ऐतिहासिक आहे. श्री विठ्ठल महोत्सव माढा शहरात भक्तिभावाने साजरा केला जातो.
माढा शहरात कसबा पेठेत असणारे हे विठ्ठल मंदिर माढ्याचे जहागीरदार राजे रावरंभा निंबाळकर यांनी बांधल्याचा उल्लेख देवळाच्या उंबरठ्याच्या कीर्ती मुखाच्या पायरीवर आढळतो. या पायरीवर ‘राव महादाजी निंबाळकर शेरणागत पांडुरंग चरणी’, असा उल्लेख आढळतो. या मूर्तीच्या हातात काठी असून हृदयावर कोरलेला श्लोक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनानुसार स्कंद पुराणातील ‘पांडुरंग महात्म्य’ यातील कूट श्लोकाशी एकरूप आहे. या मंदिराचा बहुतांश परिसर आता पडलेल्या स्वरूपात आहे. या मंदिरास सर्वत्र हिंदू मंदिरास असणार्या शिखराचा अभाव आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस श्री मल्लिकार्जुन देवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरातील शिलालेखही प्राचीनच आहे.
इतिहासकार डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या म्हणण्यानुसार माढ्यातील कसबा पेठेतील मंदिरातील ही विठ्ठलाची मूर्ती ही आद्य मूर्ती आहे. माढा येथील विठ्ठल मंदिरात मूर्ती आजही विराजमान आहे. इ.स. 1659 मध्ये अफझलखानाच्या स्वारीप्रसंगी माढा येथे पंढरपूरची विठ्ठल मूर्ती हलविली गेली होती, अशी पारंपरिक माहिती आहे. माढा येथे विठ्ठल मंदिर निंबाळकरांनी मुद्दाम बांधले. ते या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थच. या दुर्लक्षित राहिलेल्या विठ्ठल मंदिराच्या जागेची मालकी ही खासगी व्यक्तीकडे आहे. मंदिराच्या नावावर तत्कालीन जहागीरदार रावरंभा निंबाळकर यांनी रणदिवेवाडी परिसरातील 65 एकर जमीन देखभाल खर्चासाठी दिल्याचे सांगण्यात येते.
गळाभेट विठ्ठलाच्या आद्यमूर्तीची?
पंढरपुरातली विठ्ठलमूर्ती खरी की पंढरपूरजवळच्या माढा गावातली? या डॉ. रा.चिं.ढेरे यांच्या संशोधनावरून ऐंशीच्या दशकात मोठा वाद झाला. पण ख-या विठ्ठलभक्ताला या वादात रस नाही. त्यांच्यासाठी तो विठुराया फक्त देव नाही, तर मित्रही आहे. 'प्रथम भेटी आलिंगन, मग वंदावे चरण' या अभंगाप्रमाणेच तो कायमच या मित्राची मनोमन गळाभेट घेत आलाय. पण प्रत्यक्षात ही गळाभेट जरी पंढरीला घेता येत नसली तरी माढ्याला मनसोक्त घेता येते, हे मात्र नक्की...
माढ्यातील विठ्ठलमंदिर तसं फारसं गजबजलेलं नाही... अगदी ऐंशीमधल्या 'त्या' वादानंतरही नाही... अगदी हे मंदिर त्याला मंदिर म्हणावं असंही नाही... धड घुमट नाही, कळस नाही... चार बाजूंना मशिदीच्या मिनारासारखे बांधकाम... पण या मंदिरातील विठ्ठलमूर्ती प्राचीन, थेट पंढरपूरच्या विठ्ठलाशी नातं सांगणारी... एकाकी, रेखीव, गूढ आणि तरीही रम्य....
सकाळचे सहा-साडेसहा वाजलेले असतात. माढ्यातल्या त्या विठ्ठल मंदिरात एकट्या पुजारींशिवाय दुसरं कोणीही नाही. आसपासच्या नीरव शांततेमुळे हळू आवाजात सुरू असलेला मंत्रोच्चारही देऊळभर भारुन राहिलेला... नुकत्याच संपलेल्या अभिषेकामुळे विठ्ठलाचे ते सावळेपण जरा अधिकच उजळलेले... तेवढ्यात एक वयोवृद्ध बाई देवळात येते... थेट गाभाऱ्यात शिरते... विठ्ठलाच्या तोंडाला साखरेची वाटी लावते... एखाद्या लहान मुलाची दृष्ट काढावी तशी ती विठ्ठलाच्या चेहऱ्यावरुन हात फिरवते, आणि बोटं उलटी करून स्वत:च्या कानशीलाजवळ कडकन मोडते.... तिला त्या सावळ्या ध्यानात काय दिसलं ठाऊक नाही, पण तो देव तिला सोवळ्याओवळ्याच्या पलिकडला वाटतो... आपल्या पोटच्या मुलासारखा... आईच्या मायेला मुलाहून अधिक जवळ ते काय... त्या विठ्ठलाला पाहून त्या माऊलीला वात्सल्याचा पान्हा फुटावा यातच या देवाचे मोठेपण सामावलेलं आहे...
कंठात गहिवर दाटून यावा असा हा प्रसंग समोर घडत असताना, ती बाई जे बोलली ते भल्याभल्या विचारवंतांनाही तोंडात बोटं घालायला लावेल असं. देवाची दृष्ट काढून ती माऊली आकाशाकडे हात करत बोलती झाली... ''हे ईठ्ठला, काय बी नको बघ तुज्याकडून, आता जसा भेटतोस तसाच रोज भेट म्हणजे झालं''... 'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा' म्हणणारे तुकोबा याहून वेगळे काय म्हणत होते...
माढा, वीस पंचवीस हजार वस्तीचं हे सोलापूर जिल्ह्यातील गाव. खरं तर हे तालुक्याचं ठिकाण. पण कुर्डुवाडीला रेल्वेचे जंक्शन झाले आणि माढ्याचं महत्त्व कमी झाले. पण निंबाळकरांची जहागिरी असणाऱ्या या माढ्यातील हे विठ्ठलमंदिर रा. चिं. ढेरे यांच्या संशोधनाने अचानक प्रकाशात आले. ढेरे यांनी अंत्यंत अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण देत हे मांडलं की, पंढरपूरात असलेली विठ्ठलमूर्ती ही मूळ यादवकालीन मूर्ती नाही. पण मूळ मूतीर्ची जी लक्षणे सापडतात तशी मूर्ती माढ्यात सापडते.
झालं, त्यांचं हे संशोधन प्रसिद्ध झाल्यावर एकच वादळ उठलं... पंढरपूरच्या बडव्यांपासून अनेक भक्तमहात्म्यांनी या संशोधनाला प्रखर विरोध केला. पुजाऱ्यांनी आपल्या पोथ्यांवरील धूळ झटकली, संशोधकांनी आपले ग्रंथ पुन्हा एकदा बाहेर काढले. लेखावर लेख असा बौद्धिक वाद सुरू झाला. अनेक वर्ष सुरू असलेला हा वाद कालांतराने शांत झाला. पण विठ्ठलाच्या मूतीर्समोर त्याच्याप्रमाणेच कंबरेवर हात घेऊन उभे राहिलेले प्रश्नचिन्ह आजही कायम आहे.
स्कंदपुराणातील 'पांडुरंगमहात्म्य' या संस्कृत रचनेपासून ते संत सावता माळी यांच्या अभंगापर्यंत जे पंढरपूरच्या विठ्ठलाचा वर्णन सापडते, तशी मूर्ती आज पंढरपूरात नाही. हृदयस्थानावर कोरलेला कुटमंत्र हे या मूतीर्चे महत्त्वाचे वर्णन आहे. तशी मूर्ती माढे येथे आहे. तसेच १६५९ मध्ये अफझलखानाच्या आक्रमणाच्या वेळी पंढरपूरची मूर्ती माढे येथे हलवली होती, अशीही पारंपरिक माहिती आहे. या साऱ्याचे शास्त्रीय विवेचन करत डॉ. रा. चिं. ढेरे यांनी असे मांडले की माढे येथील मूर्ती आद्यमूतीर्शी साम्य सांगते. पण अशीही शक्यता आहे, की माढ्यात पंढरपूरचा विठ्ठल येऊन गेला म्हणून माढेवासीयांनी त्याची प्रतिमूर्ती स्थापन केली असेल.
या सा-या शक्यता पडताळून आपले सारे संशोधन मांडत असताना ढेरे हे स्पष्ट करतात, की यामुळे पंढरपूरचे स्थानमहात्म्य कमी होत नाही. कारण भारतीय धर्मशास्त्रानुसार महत्त्व मूतीर्ला नसून स्थानाला आहे. म्हणूनच काशीचा विश्वनाथ किंवा सौराष्ट्राच्या सोमनाथाची मूळ शिवलिंगे आस्तित्वात नसूनही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. हे वास्तव लक्षात घेऊन प्रत्येक पांडुरंगभक्ताने या संशोधनाकडे पाहिले पाहिजे. केवळ आणि केवळ अभ्यासातून पुढे आलेले सत्य मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यावर जर कोणी पुनअर्भ्यास केला आणि त्याला वेगळे काही सापडले तर ते जाहीरपणे स्वीकारण्याची कबुलीही ढेरे आपल्या या संशोधनात देतात.
हे सारे खरे असले तरी ढेरे यांच्या या संशोधनावर बरीच राळ उठली. अनेक धर्ममार्तंडांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. 'विठ्ठलभक्तांच्या भावना दुखावणारे संशोधन' अशी त्यावर टीका झाली. काहींनी तर त्यावर आक्षेपही नोंदवले. त्यात अशा पद्धतीने मूतीर्वर मंत्र असणे हे वैदिक नाही. तसेच स्कंदपुराणावरच शंका व्यक्त करण्यात आली. याव्यतिरीक्त मूतीर्च्या विविध बाजूंवरही आक्षेप घेण्यात आले. पण ढेरे यांनी या आपल्या लेखांमधून आणि 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' या ग्रंथामधून उत्तरही दिले आहे. पण तरीही आद्यमूतीर्चा हा वाद भावनांच्या वादळात हरवून गेला आणि एका ठोस उत्तरापर्यंत आला नाही हेच खरे...
आज या वादाला सत्तावीस वर्षे उलटून गेलीत. डॉ. ढेरेही आता वयोमानाने थकलेत. २१ जुलैला ते आपल्या वयाची ऐशी वर्ष पूर्ण करताहेत. त्यांनी केलेले हे संशोधन आजही अनेक अभ्यासक आणि जिज्ञासूंना एका नव्या वाटेकडे बोट दाखवत उभे आहे. पण त्यांची परंपरा कायम ठेवत हा सत्याचा शोध घेणारे हे संशोधन पुढे चालू आहे असे ठोसपणे दिसत नाही. 'त्या' वादानंतर चंदभागेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. संशोधनाची माध्यमे बदलली आहेत, विज्ञान अधिक पुढे गेले आहे. या नव्या साधनांचा उपयोग करून सत्यान्वेषी संशोधनाची ही पालखी नव्या खांद्यांवर विसावायला हवी.
या वादात आणखी एक मुद्दा माढ्यातील आताचे पुजारी असलेले उत्कर्ष कुंभेजकर मांडतात. ते म्हणतात, की पंढरपूरच्या विठ्ठलमूतीर्च्या आणि रुख्मिणीमातीच्या दगडात फरक जाणवतो. पण पंढरपूरच्या रुख्मिणीमातेचा दगड आणि माढ्यातील विठ्ठलमूतीर्चा दगड सारखा वाटतो. कदाचित हे शिल्पकलेच्या अभ्यासकांना अधिक स्पष्टपणे मांडता येईल. त्यासाठी या दिशेने अधिक अभ्यास व्हायला हवा याकडे ते लक्ष वेधतात.
कारण कितीही अप्रिय असली तरी 'सत्याची कास' धरणे ही आपली परंपरा आहे... अशा वादांना न डगमगता महाराष्ट्राने अनेकदा कटू सत्य मांडली आहेत, पचवली आहेत. म्हणूनच 'सन्याशाचं पोर' म्हणून वाळीत टाकलेले ज्ञानेश्वर इथे 'माऊली' ठरतात आणि इंदायणीत पोथ्या बुडवूनही तुकाराम 'जगद्गुरू' म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच 'ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे' म्हणणाऱ्या मराठी मनाने तरी विठ्ठलाचा हा अभ्यास अखंड सुरू ठेवायला हवा.
अखेर देव हा मूर्तीत नाही हे वारकऱ्यांच्या भागवतधर्माचे सार आहे. म्हणूनच दगडाच्या त्या मूर्तीपेक्षा माणसातला देव भागवतधर्मात मोठा मानला गेलाय. म्हणूनच हजारो मैल चालून वारकरी जो पंढरीला जातो त्याला विठ्ठलाच्या मूर्ती दिसावी ही आस नसते. त्याला आस असते ती पंढरीला जाण्याची, त्या प्रवासाची. कारण त्या वारीतले समाजजीवन त्याला समृद्ध करणारे असते. त्याच्यासाठी ते देवदर्शन ही फक्त औपचारिकता असते. ते प्रत्यक्षात झाले नाही तरी तो कळसाचे दर्शन घेऊन माघारी परततो. कारण त्याच्यासाठी विठ्ठल त्या दगडाच्या मूतीर्त नसून एकमेकांच्या अंतरात आहे. म्हणूनच एक वारकरी दुस-या वारक-याला भेटतो, तेव्हा त्याच्या पाया पडतो. माणसातच देव मानण्याची ही प्रथा मूर्तीचे गौणत्वच स्पष्ट करत नाही का?
असे असताना इतिहासाच्या पुराव्यावर विठ्ठल या देवतेचा अभ्यास करणे चुकीचे कसे ठरते? शेवटी ही दैवते माणसाने माणसाच्या विकासासाठी घडवली आहेत. श्रीविठ्ठल हा तर मराठी भाषकांनी घडवलेला देव आहे. गेली आठशे वर्ष तो मराठी भावविश्वाचा अविभाज्य भाग आहे. ब्राह्मण वर्णातल्या ज्ञानेश्वरांपासून चोखा महारांपर्यंतचे त्याचे भक्त त्याच्या सर्वसमावेशकतेची साक्ष देत उभे आहेत. फक्त जातीपातींच्या भिंतीच नाहीत तर भारतातील शैववैष्णवांाच्या वादावर पडदा टाकत 'विष्णुसहित शिव' म्हणून तो चंदभागेच्या काठी उभा ठाकतो. एकंदरीतर विविध ज्ञानप्रज्ञांच्या प्रवाहांचा हा महासमन्वय फक्त भक्तांनाच नाही तर अभ्यासकांनाही कायम खुणावत राहीलाय.
त्याचा हा अभ्यास फक्त मराठीजनांनीच नाही तर भारतातील विविध भाषांमध्ये आणि अनेक विदेशी संशोधकांनी केलाय, करीत आहेत. शेवटी हा मूळचा गवळी-धनगरांचा लोकदेव आज अवघ्या मराठी मनाची विठुमाऊली आहे. त्याला कधी सोवळ्याओवळ्याचे बंधन नव्हते ना, शोडषोपचाचाराची गरज. आज त्याच्या पुजेत हे सारे असले तरी ते मुळचे नाही. कारण ज्ञानेश्वरांपासून चोखोबांपर्यंतच्या संतांनी त्याच्या ओव्या गायल्यात आणि त्याला शिव्यााही घातल्यात. 'आहे असा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनी अनुभवावा।। ' असे सांगत तुकारामांनी तर माणसातल्या देवापुढे या दगडाच्या देवाचे अस्तित्वच नाकारले आहे.
वारकरी सांंप्रदायाने मानलेल्या या माणसाच्या देवत्त्वाची साक्ष माढ्यातील एका अनुभवात आली. पंढरीच्या वाटेवर असलेल्या माढ्यातील विठ्ठलाची ज्याला माहिती आहे. ते वाट वाकडी करुन या देवळापर्यंत पोहचतात. त्या दिवशी दुपारी असेच काही वारकरी देवळात आले होते. त्यातल्या एकाने हातातली दुधाची वाटी विठ्ठलमूतीर्पुढे ठेवली आणि मनोमन हात जोडले. त्यानंतर ती वाटी देवळातच वावरणाऱ्या एका लहानग्याच्या हातात ठेऊन त्याने त्या मुलाच्या पायावर डोके ठेवले. अशा नमस्काना सरावले असल्यामुळे असेल कदाचित पण त्या मुलानेही त्या काकांना नमस्कार केला. उगी दगडाच्या मूतीर्वर दूधाचा अभिषेक करण्यापेक्षा एखाद्याच्या अंतरीचा पांडुरंग सुखावण्याची त्याची ती कृती खूप काही शिकवून गेली.
त्या वारकऱ्यासाठी ती मूर्ती मूळमूर्ती आहे का नाही याच्याशी काहीच घेणेदेणे नव्हते. त्याला पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या या दुसऱ्या विठ्ठलाला भेटावेसे वाटले, आणि तो आला एवढेच. तीच भावना घेऊन माढ्यातून परतायची वेळ झाली होती. ज्या पावलांची पूजा जन्मभर घडावी असे मागणे संतांपासून सर्वांनी मागितले, त्या पावलांवर डोके ठेवले. त्या क्षणी मनात आले, की कदाचित याच पावलांवर ज्ञानदेव, नामदेव, मुक्ताईपासून तुकाराम, निळोबांपर्यंतच्या संतांनी डोके ठेवले असेल. आपल्याला जगायला याहून आणखी काय प्रेरणा हवी...
nilesh.bane@timesgroup.com
विठ्ठलाची विराजमान मूर्तीच मूळ : डॉ.गो.बं देगलूरकर
- नम्रता फडणीस
* पांडुरंग ही लोकदेवता आहे. मात्र पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मूर्तीबाबत मतमतांतरे आहेत. असे का ?
- महाराष्ट्राचे मुख्य दैवत म्हणून पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाकडे पाहिले जाते. संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामांपर्यंत अनेक संतांनी पांडुरंगाचे वर्णन करणा-या अनेक रचना केल्या आहेत. पण हे ही तितकेच खरे आहे की या मूर्तीबददल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत, ही मूर्ती विष्णुची की श्रीहरिहराची? हिचे दोन्ही हात कटिस्थित का? काहींच्या मते ही मूर्ती बुद्धाची आहे तर आणखी काही जणांचे म्हणणे आहे की आज पंढरपूर येथील गाभा-यात जी मूर्ती आहे ती मूळची नाही. मूळची मूर्ती अन्यत्र हलविली गेली आहे. मात्र हे सर्व प्रश्न गैरसमजातून आणि मूर्तीशास्त्राविषयीच्या अज्ञानातून निर्माण झाले आहेत.
* मग मूर्तीचा खरा इतिहास काय ?
_- श्रीविठ्ठल महाराज सहाव्या शतकापासून पंढरीत आहे. जिची उपासना आजही चालू आहे. कारण या मूर्तीच्या ठेवणीतून आणि अलंकारातून त्या काळाची कल्पना येते. उदा: मूर्तीच्या कानातील मकरकुंडल या काळातील शिल्पातून आढळतात. दोन्ही हात कटिस्थानी असल्याच्या विष्णुमूर्ती पाचव्या शतकातील विदिशाजवळील (मध्यप्रदेश) उदयगिरी लेणीत आहेत. ही मूर्ती विष्णुची आहे. हिच्या हातात शंख आहे. कुषाण काळात म्हणजे इसवी तिस-या व चौथ्या शतकात अशा मूर्ती पाहायला मिळतात. संत निवृत्तीनाथ आणि संत नामदेव या मूर्तीचे वर्णन ‘चोविसा मूर्तीहूनी वेगळा हा पंचविसावा’ असे करतात. हिच्या हाती जो मुकुट आहे तो शिवाच्या पिंडीच्या आकाराचा आहे. हे लक्षात न घेता ती शिवपिंडच आहे, अशा गैरसमजूतीतून ’शिवाकार मुकुट कस्तुरी भाळी’ असे हिचे अठराव्या शतकात वर्णन केले गेले . तिला हरिहर मानले गेले आहे. मुळातच ही विठ्ठलाची मूर्ती ही योगमूर्ती आहे. ती उभी आहे म्हणून स्थानापन्न आहे. ज्ञानेश्वरांनी ‘ऐसा हा योगीराज तो विठ्ठल मज उजु’ असे प्रथम सांगितले होते.
* मूळ मूर्ती अन्यत्र हलविली गेली. यामध्ये कितपत तथ्य आहे?
- श्रीविठ्ठलाची मूर्ती हलविली गेली होती हा इतिहास सांगतो. जे खरं आहे. परकीय नृशंस आक्रमणापासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ती एक ते दोन वेळा सुरक्षित स्थळी हलविली गेली होती. पण योग्यवेळी ती परत आणण्यात आली आणि तिची मंदिरात पुनसर््थापनाही करण्यात आली होती. हे इतिहासाने सिद्ध केले आहे. डॉ. ग.ह खरे यांनी यासंबंधीची माहिती विस्ताराने आणि पुराव्याधारित ‘महाराष्ट्राची चार दैवते’ या पुस्तकात दिली आहे. ही मूर्ती माढा(जि.सोलापूर) येथे हलविली गेल्याचे सांगोवांगी इतिहासात आलेली गोष्ट आहे. मात्र इतिहासाचा कोणताही आधार त्याला नाही. पंढरपूरजवळ ‘देगाव’ नावाचे गाव आहे. तिथल्या बडव्यांनी संकटाच्या वेळी तिथल्या पाटील किंवा ग्रामपंचायतीला दिली. ती नेऊन दिल्याची आणि परत आणल्याची पावती आहे. हे खरे यांनी पुस्तकातही नमूद केले आहे. देगाव च्या ऐवजी कुणीतरी माढे म्हणाले असेल. सध्याची पंढरपूरची मूर्ती आधीही तिथे तशीच्या तशी असणार. ती बदलायची झाली तरी ती तशीच्या तशीच करा असे कारागिराला सांगितले जाते.
* माढा येथील मूर्ती आणि पंढरपूरमधील मूर्तीमध्ये कोणता फरक आहे?
- पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती पाहिली की लक्षात येईल ती माढ्याच्या मूर्तीपेक्षा खूप जुनी आहे. पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये ‘मकरकुंडल’ आहेत तर माढ्याच्या मूर्तीत ’शंखकुंडल’ आहेत. ‘कांसे पितांबर’ अशी ती नाही. माढ्याची मूर्ती नग्न आहे. त्या मूर्तीच्या हातात जी काठी आहे तशी पंढरपूरच्या मूर्तीत नाही. त्यामुळे पंढरपूरची पांडुरंगांची मूर्ती मूळ मूर्ती प्रमाणेच घडविली आहे, माढ्याला हलविण्याचे काहीच कारण नाही.
* पांडुरंगाची मूर्ती जर विष्णुची आहे तर त्याचा ’विठ्ठल’कसा झाला?
-विष्णुचे अपभ्रष्ट रूप हे विठ्ठु होते. त्याला इतिहासाचा एक पुरावा आहे. चेन्नईमध्ये व्यंगीचे राज्य होते. तिथे पुलकेशन हा बदामीच्या चालुक्याचा राजा होता. त्याने विष्णुवर्धन या आपल्या भावाला राज्य दिले. त्याला कुब्ज विष्णुवर्धन म्हटले जायचे. त्या विष्णुवर्धनबददलचे जे शिलालेख आहेत त्यात काही वेळा ‘‘विटटू’, ‘विठू’ असे काहीसे भ्रष्ट रूप आलेले आहे. थोडक्यात विष्णुचे ‘विठठू’ झाले आणि त्याला पुढे ‘ल’ लागला. विष्णु हा विठ्ठल रूपात आलेला आहे हे यातून स्पष्ट होते. विष्णुची मूर्ती पंढरपूरातही स्थापन झाली आणि त्याचा ‘पांडुरंग’ आणि ‘विठ्ठल’ झाला.
* शास्त्र आणि लोककथा यात कमालीचा फरक जाणवतो, असे का?
-कारण शास्त्र आणि लोककथा यात मुळातच फरक आहे. लोककथेत सत्याचा अंश असतो जो ऐतिहासिक सत्याशी सुसंगत नसतो. लोककथेमधूनच रूख्मिणी आली मग दिंडीर वनात रूसून बसली. ती आली मग तिच्या मागे कृष्ण आला तो तिथेच थांबला. रूख्मिणी रूसून जाण्यापर्यंत कृष्णाने काय केले असेल. मग त्याची रूपं आपणच पाहायला लागतो. संताच्या अभंगामध्येही पांडुरंगाला कृष्ण संबोधले आहे. विठठल रूख्मिणी हे गृहीतचं े धरल्यामुळे रूख्मिणीचे वेगळे मंदिर उभारण्याची काहींना गरजच वाटत नाही. पंढरपूरमध्ये मात्र वेगळे आहे.
* इतिहास सोयीने बदलला जातो ,असे वाटते का?
- परंपरेने एकच विचार पुढे येतो तेव्हा दुसरा विचार रूजायला वेळ लागतो. ३३ कोटी देव म्हटले जाते; पण खरे ३३ प्रकारचे देव आहेत. जाणकारांना हे सांगितले तर पटते; पण सामान्य लोकांच्या पचनी पडत नाही. अभ्यासकांना माहिती असूनही लोकांच्या श्रद्धेला तडा जाऊ नये म्हणून कोणी बोलत नाही.



















































































No comments:
Post a Comment