Tuesday, February 15, 2022

कोराईगड(Koraigad )

 



 एखाद्या किल्ल्याला ईतिहासातील एखादे झुंज, एखादी कथा, निसर्गरम्य परिसर, चढण्याच्या सोप्या वाटा, बर्‍यापैकी शाबुत असलेले अवशेष, एखादे आधुनिक आकर्षण असे बरेच काही लाभलेले असते. साहजिकच हा गड नुसता दुर्गभटक्यांची राबता असणारा न रहाता सर्वसामान्य पर्यटकांनासुध्दा आकर्षित करतो. असाच एका गडावर आज आपण पावसाळी भटकंती करणार आहोत, तो म्हणजे "कोराईगड". लोणावळ्याच्या दक्षिणेस पवनमावळात कोरबारस नावाचा भाग आहे. याच परिसरात आहे, कोराईगड. यालाच कोरीगड, कुंवारीगड आणि पेठ शहापुर या पायथ्याच्या गावामुळे शहागड अशी नावे आहेत.कोरी हे एका कोळ्यांच्या पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय.  ह्या गडावर असलेली कोरीव गुंफा आणि परिसरात असणारी कार्ला, भाजे आणि बेडसे लेणी पहाता गडाचे वयोमान किमान तेराशे वर्षाचे निश्चित, पण आपल्याला ज्ञात ईतिहास आहे, निजामशाहीपासून.गडाची उभारणी तैलबैल्या, घनगडाजवळून चढणार्‍या घाटवाटा आणि कोरीगडाजवळचा सव घाट यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असणार. मलिक अंबरच्या ताब्यात हा गड होता. शिवाजी महाराजांनी १६५६ च्या सुमारास ढमाले देशमुखांकडून हा गड घेतला. पुढे पुरंदरच्या तहात या परिसरातील तुंग, तिकोणा, लोहगड व विसापुर मोगलांना दिले तरी कोराईगड आपल्याच ताब्यात ठेवला. ३ व ५ ऑगस्ट्च्या केरीदुर्ग (Kerridurg ) शिवाजीराजांनी मोघलांकडून ११ जुन १६७० ला घेतल्याचा उल्लेख आहे पण तो चुकीचा आहे, कारण केरिदुर्ग म्हणजे कुर्डूगड, कोराईगड नाही. सन १६९४ मधे औरंगजेबाच्या स्वारीत मोंगलानी गड घेतला, पण लगेच तो पंताजी शिवदेव, कदम, दामाजी नारायण यांनी परत घेतला.त्याची हकीकत अशी आहे. नोव्हेंबर १६९५ ला औरंगजेबाचा मुक्काम विजापुर जिल्ह्यातील गलगली इथे होता. त्याने जुन्नरचा किल्लेदार आणि फौजदार मन्सूरखान याला कुवारीगड जिंकून घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार मन्सूरखानाने आपला मुलगा मुहम्मद काजिम याच्या हाताखाली सैन्य देऊन पौड मावळाकडे रवाना केलं. काजिमच्या लोकांनी किल्ल्यातल्या रायाजी बाहुलकर नावाच्या माणसाला अमिषं दाखवून आपल्या बाजूला वळवून घेतलं. मोगल शिड्या लावून आत शिरले, भयंकर रणकंदन सुरू झाले. मोगलांच्या सैन्यबळामुळे आणि रायाजीच्या फितुरीमुळे कुवारीगड मोगलांच्या ताब्यात गेला. त्र्यंबक शिवदेव आणि मोरो नारायण हे अधिकारी कैद झाले , तर गिजोर्जी निंबाळकर, दिनकरराव आणि त्यांचे निष्ठावंत मराठे स्वामीकार्यावर खर्ची पडले. कुवारीगडाच्या पराभवाची बातमी शंकराजी नारायण सचिवांच्या कानावर येऊन पोहोचली. त्यावेळी ते राजगडावर होते. मोगलांनी किल्ला भेद करून घेतल्याच्या बातमीने ते दु:खी झाले. पण खचले नाहीत. त्यांनी कुवारीगड परत जिंकून घेण्याचा निश्चय केला. गडावर मोघली सैन्य वेढा घालून बसले होते. मोघली सरदार मुहम्मद काजिमचा बाप मन्सूरखान हा जुन्नरचा फौजदार कुवारीगड उर्फ कोरीगडाच्या पायथ्यास असलेल्या मोघलांना रसद पुरवित असे.
      शंकराजी नारायण सचिवांनी नावजी बलकवडे आणि बाळोजी नाईक ढमाले यांच्यावर ही रसद मारण्याची कामगिरी सोपविली होती.एकदा जुन्नरवरून अशीच रसद कोरीगडाकड़े येण्यास निघाली असता बाळोजी ढमालेंनी त्यावर छापा घातला. मोगलांनकड़े अवजड तोफा आणि घोड़दळ सुद्धा होते. मराठ्यांनी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा असा काही वापर केला, की मोगल सैन्याची पार दाणादाण उडाली आणि पाहता पाहता त्यांचं सैन्य विखुरलं गेलं. मोघल सैनिक जेथे वाट मिळेल तेथे सैरावैरा पळू लागले. मराठ्यांच्या हाती अमाप पैसे आणि शेकडो अरबी घोड़े लागले. या युद्धात मराठ्यांचा मोठा विजय झाला पण शौर्याने लढ़णारे बाळोजी नाईक ढमाले या लढाईत धारातीर्थी पडले.
     ११ मार्च १८१८ ला कर्नल प्रॉथर सिंहगड्,पुरंदर, लोहगड, राजमाची आदी बलदंड किल्ले जिंकून ईथे आला. ११,१२ व १३ मार्च असे तीन दिवस धडका देउन ईंग्रजांचे सैन्य चांगलेच वैतागले. अखेरीस १४ मार्च रोजी नेमका एक तोफगोळा दारुच्या कोठारावर पडला आणि प्रचंड स्फोट झाला. ज्याच्या जिवावर लढायचे ते दारु कोठार नष्ट झाले आणि कोराईगडाने शरणागती पत्करली.
    हा झाला ईतिहास पण या कोराईगडावर एक दंतकथाही सांगितली जाते. महाड जवळ पिंपळवाडी या गावी लुमाजी भोकरे हा कोळी प्रमुख होता. त्याला मोठे ईनाम आणि संपत्ती पाहिजे होती. यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे काही पराक्रम करणे आवश्यक होते. तेवढ्यात त्याला कोरीगडावर एक तगडा अरबी घोडा असल्याचे समजले. आपण तो घोडा बादशहाला नजर करतो असे त्याने सांगितले.लुमाजीने कोळ्यांना मदतीला घेउन कोराईगडाला वेढा घातला. जवळपास तीन महिने झाले पण काही उपयोग होईना. अश्यातच महाडच्या मुसलमान सरदाराने त्याला खलिता पाठविला कि ,'तु कबुल केल्याप्रमाणे बादशहाला अजून घोडा दिलेला नाही. जर लवकरच काही हालचाल केली नाहीस तर तुला शिक्षा करीन'. हे एकून वेढ्यातील बरेच कोळी पळून गेले, मात्र काहीजण लुमाजीच्या पाठीशी राहिले. तेव्हा लुमाजीने वेष पालटून लाकुडतोड्याच्या रुपात गडावर शिरकाव केला व त्या घोड्याचा माग लावला. काही दिवस त्याने गडावर राहून पहार्‍याचा अंदाज घेतला आणि एके रात्री गडावरून माळ म्हणजे ठराविक अंतरावर गाठी बांधलेली दोरी सोडली, मात्र ती माळ खाली उभारलेया कोळ्यापर्यंत पोहचत नव्हती. लुमाजीने युक्ती केली आणि एकाच्या खांद्यावर दुसर्‍या उभे करून अखेरीस तो वर चढला आणि त्या घोड्यापर्यंत पोहचून त्याने तो पळविला, पण नेमके हे एका पहारेकर्‍याच्या लक्षात आले. त्याने लुमाजीवर गोळी झाडली, पण ती लागली त्या घोड्याला आणि तो घोडा मेला. लुमाजी मात्र गडावरुन निसटला आणि गावी परत आला. पण त्याला काळजी वाटु लागली कि आता आदिलशहा शिक्षा करणार. पण लुमाजीने केलेल्या धाडसी प्रयत्नाबध्द्ल खुश होउन आदिलशहाने त्याला ईनाम दिले.
  या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत
१ ) लोणावळ्यावरून भुशी डॅम- लायन पॉईंट-घुसळखांब मार्गे पेठ शहापुर किंवा आंबवण्याला यायचे. इथून दोन्ही गावातून गडावर चढणार्‍या वाटा आहेत.
२ ) पुणे-मुळशी-ताम्हिणी घाटातून एक रस्ता येकोलेमार्गे आंबवण्याला येतो. ईकडूनही कोराईगडाला येता येईल.

कोराईगड परिसराचा नकाशा
  स्वताची गाडी असेल तर फारच सोयीचे कारण या परिसरात खुपच कमी बससेवा आहे. थोड्याफार खाजगी जीपही या रस्त्यावर धावतात. १०.३० ला तिसकारी आणि १२.३० भांबुर्डे या बस सोयीच्या आहेत.


 लोणावळ्यावरून पेठ शहापुर २० कि.मी.वर आहे. घुसळखांब ओलांडून आपण पेठ -शहापुरच्या जवळ आलो कि एखाद्या पाचरीसारखा जमीनीत रुतून बसलेल्या ताशीव खडक, तटबंदीचे शेला पागोटे लेवून कोराईगड सामोरा येतो. हा रस्ता अँबी व्हॅलीमुळे खुपच चांगला आहे. 
दुतर्फा घनदाट झाडी, झुळझुळीत रस्ता आणि वाटेत लागणारे शिवलिंग, लायन यासारखे पाँईट यामुळे हा प्रवास कधी संपला ते कळतच नाही. पायथापासून गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत.
१ ) पेठ शहापुरपासून एक वाट मोठा वळसा घेउन सोप्या पायर्‍याच्या वाटेने साधारण पाउण तासात गडावर पोहचवते. ह्या वाटेने पुर्व बाजुच्या दरवाज्याने आपण गडावर प्रवेश करतो.
२ ) आंबवणे गावातून एक वाट थेट गडाच्या पश्चिम दरवाज्याकडे गेली आहे, पण हि वाट काहीशी अडचणीची आणि फारशी वापरात नाही.
 आपण पुर्व दरवाज्याच्या वाटेने जाउ. सुरवातीला पायवाट सहारा अँबी व्हॅलीकडे जाते. ईथे आजुबाजुच्या परिसरातील गावकर्‍यांना रोजगार मिळाला आहे. साधारण वीस-पंचवीस मिनीटे चालले कि उजवीकडे पायर्‍यांची वाट दिसते.
 एन पावसात आल्यास या पायर्‍यांवरून धबधब्यासारखे पाणी वहात असते.
 
या वाटेने पंधरा मिनीटे चढून गेल्यानंतर एक कोरीव लेणे आणि शेजारी नव्याने जीर्णोध्दार केलेले गणपतीचे मंदिर दिसते. गणेशाचे दर्शन घेउन पुढे निघायचे. या कोरीव लेण्याचा उपयोग पहारेकर्‍यांची कोठी म्हणुन होत असावा. कोरीव लेण्याच्या शैलीवरून गडाचे प्राचीनत्व लक्षात येते, मात्र नक्की काळ समजला नाही.
    गडावर पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने ईथल्या टाक्यातील पाणी भरुन घ्यावे किंवा शहापुरमधून देखील पाणी भरुन घेता येईल किंवा उत्तम म्हणजे स्वताचे पाणी सोबत आणणे.
दहा मिनीटातच गडाचा दक्षिणमुखी दरवाजा सामोरा येतो.

ईथे दरवाज्याजवळच डाव्याबाजुला तटावर एक मानवी चेहरा कोरलाय. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर गवताळ लांब पसरलेले पठार पहाण्यास मिळते. खालून गडाचे भेदक दर्शन झाल्यानंतर एवढी मोठी सपाटी पाहून आपण थक्क होतो. समुद्रसपाटीपासून ९२० मीटर उंचीचा ह्या गडमाथ्यावरून बराच मोठा परिसर दिसतो. मुख्य म्हणजे ईतक्या लढाया होउनही अजुनही तटबंदी खणखणीत आहे.
     हवा स्वच्छ असेल तर गडमाथ्यावरून उत्तरेला नागफणीचे टोक, त्याचा मागे राजमाचीचे जुळे बालेकिल्ले, ढाकचा किल्ला, ईशान्येला सरसगडाची कातळटोपी, पश्चिमेला कर्नाळा, प्रबळगड, माथेरान, ईर्शाळगड, माणिकगड, दक्षिणेला मुळशी धरणाचे पाणी, लांबवर तोरणा आणि पुर्वेला तुंग, तिकोणा आणि मोरगिरी दिसतात.
  आधी आपण उत्तर टोकाशी जाउया.
 या बाजुला दोन मोठी तळी आहेत. ह्या दोन्ही तलावात काळे पाणविंचू आणि स्पंज जातीच्या प्राण्यांच्या वसाहती आहेत.
 गडाच्या उत्तर पश्चिम टोकाशी तीन छोट्या गुहा आहेत, यातील मधल्या गुहेत चतुर्भुज विष्णुची मुर्ती आहे. या बाजुला पाण्याचे एक टाके आहे, त्याला गणेश टाके म्हणतात.

ईथेच जवळ गणपतीचे छोटेसे मंदिर आहे. आतमधे गणेश मुर्ती आणि ईतरही काही मुर्ती आहेत.
उत्तर टोकाशी जाउन उभारले की खाली गडाची पेठ, म्हणजे जिथून गडाला रसद पुरविली जाते, ते पेठ शहापुर दिसते.
 एन पावसाळ्यात ईथे आल्यास या बाजुच्या तटबंदीतून वहाणारे पाणी पावसाळ्यात धबधब्याच्या स्वरुपात बाहेर पडताना दिसते.
  पशिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने आपण उत्तर टोकाकडे जाउया.
याच दक्षिण बाजुला चार तोफा व्यवस्थित लोखंडी स्टँडवर मांडून ठेवलेल्या दिसतात.
यापैकी कोराई मंदिराजवळ असलेली सर्वात मोठी तोफ आहे, "लक्ष्मी तोफ".
या नंतर गडाचा आंबवण्याकडचा दरवाजा आपल्याला दिसतो. एकूण त्याचे स्वरुप पहाता, हा नक्कीच मुख्य दरवाजा नसणार.
याच बाजुला खाली आंबवणे गाव दिसत असते.
शेवटी आपण दक्षिण टोकाला पोहचतो. हि बाजु तुलनेने नाजुक, त्यामुळे ईथे दुहेरी तटबंदी, म्हणजेच चिलखती तटबंदी घातलेली आहे.
जर आपण ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत आल्यास गडमाथा सोनकीच्या पिवळ्या फुलांनी भरून गेलेला असतो. या बाजुला आणखी काही तोफा आहेत. या नंतर गडाच्या पुर्व तटबंदीच्या कडेकडेने चालु लागल्यास खाली दरीत एक आधुनिक मानवनिर्मीत पण मुग्ध करणारी गोष्ट पहायला मिळते, " सहारा सिटी, अँबी व्हॅली".


साधारण २००० साली असे आधुनिक शहर उभे करावे असे असे श्री. सुब्रतो राय यांच्या मनात आले आणि लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरापासून जवळ सहारा ग्रुपने हे शहर वसविले. बरीच मोठी प्रवेश फि भरुन आपणही हे शहर आतून पाहु शकतो, पण ते शक्य नसेल तर चिंता नाही. कोराईगडावर विनाखर्च आपण याचा आनंद घेउ शकतो, ते ही बर्ड आय व्ह्युने.
 


खाली दिसणारे कारंजे, ऑडीटोरीयम, बंगले, जलतरण तलाव, पाण्याचे मोठे तलाव अतिशय विहंगम दिसतात.
कोराईगड बघायला जेमेतेम दोन-अडीच तास पुरतात, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रात्री कोराई देवीच्या मंदिरात मुक्काम करून याच सहारा सिटीचा रात्रीचा नजारा बघता येईल.
  मी २००२ साली गेलो होतो तेव्हा सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप उभारला होता, येणार्‍या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जातात, हे सर्व काढून घेतले गेले.
गडफेरी पुर्ण करुन आपण पुन्हा महादरवाज्यापाशी परत येतो.
      गड फेरी उरकून आपण गडमाथ्याच्या मधोमध असणार्‍या कोराई देवीच्या मंदिरात जाउ. गडाच्या मध्य भागी काही उध्वस्त घरांचे चौथरे पहाण्यास मिळतात.खरं तर ह्याठिकाणीच थोडी दुरुस्ती करुन भटक्यांना रहायची सोय करुन देता येईल. सध्या तरी जीर्णोध्दार केलेले कोराई मंदिर हाच एकमेव निवारा गडावर आहे.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर अंदाजे ४ फुट उंचीची कोराई देवीची त्रिशुळ, डमरु, गदा आदी धारण केलेली मुर्ती पहाण्यास मिळते. या कोराई देवीसंदर्भात एक कथा सांगितली जाते.जेव्हा १८१८ च्या युध्दानंतर ईंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा कोराई देवी दागिन्यांनी मढलेली त्यांच्या नजरेस पडली, त्यांनी हे दागिणे ईथुन हलवून मुंबईच्या मुंबादेवीला अर्पण केले. सध्या मुंबादेवीच्या मुर्तीवर हेच दागिने आहेत असे मानले जाते.मलातरी हि कथा पटत नाही. लुटमार करण्यासाठीच या देशात आलेल्या ईंग्रजाना ईतके मोठे घबाड मिळाल्यावर ते असे दागिने दुसर्‍या देवीच्या अंगावर चढवतील यावर माझा विश्वास नाही.असो. 
या शिवाय गडावर शिवमंदिरही आहे.
   एकंदरीत फारशी दमणुक न करता, लोणावळ्याच्या पर्यटकांनी गजबजलेल्या परिसरात असलेला हा किल्ला एक दिवसाची सवड काढून नक्कीच पहाण्यासारखा आहे. फक्त गडावर किंवा पायथ्याशी खाण्यापिण्याची फारशी सोय होण्याची शक्यता नसल्याने वाटेत घुसळखांब किंवा लोणावळ्याला जेवण्याच्या वेळेत पोहचू असे प्लॅनिंग करावे.









नुकतेच कोराईगडावर दुर्ग संवर्धनाचे उत्तम कार्य झाले,त्याचे फोटो वर पोस्ट केलेले आहे.

     ईच्छा असल्यास तैलबैल्याच्या पाषाण भिंती आणि घनगडही पहाता येईल किंवा तुंग किल्ला पाहून परत जाता येईल.     

संदर्भग्रंथ :-
१ ) पुणे जिल्हा गॅझेटियर
२ ) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !!-प्र.के. घाणेकर
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) शोध शिवछ्त्रपतीच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
६ ) किल्ल्यांच्या दंतकथा- महेश तेंडुलकर


Difficulty level: Easy
Endurance level: Easy
Things to carry: Sports Shoes must, 2 liters of water, some snacks, Tents, Torch, Lighter
How to Reach: Follow Google maps.
This was the first trip to fort we took in the night. I, Arriesh, Shashikant and Swarup started by car at 11 PM from Pune. Shashikant and Arriesh arranged the tents. We packed our bags that would require us for staying overnight, start bonfire, make some barbecue, etc.
After crossing Lonavala, we decided to take first stop and see how the view is from Lion’s point. That is when we were stopped by patrolling Police. They asked us various questions like where we came from, where we want to go, where we are from etc. Without letting us talk anything, they asked us to return back. Somehow Shashikant convinced them that we are just going to visit Korigad and will not invite any kind of trouble.
We reached the base village at 1 AM, parked the car near the temple. We were looking for a mobile tower from where the path leads to the fort. As soon as we started walking on unpaved road, we saw four dogs barking at us. We let them settle down and after a while, they started following us. When we were not able to find the correct path, we were actually following them.
We went past the mobile tower and continued walking straight. Dogs did took right after a patch where a crane was installed. We thought it must be for some kind of construction and kept walking straight. We reached a spot where there was no fencing but we could see some houses and proper lights. We then realized we came to Amby valley.
40681439042_faa665c601_o
We returned from there and came back to the same place where we saw crane. It was indeed the spot from where the steps to fort start. Dogs were still with us and leading the way. We had couple of torches with us to light the way. Due to the darkness, we could hardly spot anything on the way.
40568128652_a1e2e4d36c_o
We reached the top in an hour. We took the right turn and could see some huts near a lake. We thought of putting up our tents there. Shashikant and I started setting up tents. Arriesh and Swarup were looking for things to start the bonfire. Fortunately there were many cow-pats around. It helped quickly ignite the bonfire.
38800616380_d2f27a08d1_o
Once the bonfire was lit, we used some vegetables for barbecue and discussed various things. After an hour, we went to sleep.
We got up early to see the sunrise. It did not disappoint us. It was a great experience to see the sunrise over the Amby valley from top of the fort.
38914091280_5abc5cc927_o
As the darkness goes away, we noticed many different colors in the sky. It was soothing.
Our tents near the lake.
39899338374_9aac1767eb_o
Just beside our tent, we could see Lord Shiva temple.
40610594741_cdc5cf9c03_o
We got ready and started exploring the fort. New fortification being built.
40568209282_4945e7e345_o
We went to northern side of the fort where there is a saffron flag.
38800666820_b2219bce7e_o
From here, we could see base village and surrounding hills.
39899350004_bfe2d22d27_o
We were roaming around the perimeter of fortification. There is a small cave.
25739876337_b9ecc4815c_o
Moving towards south, we could see entire plateau on the fort.
25739893207_1fcd600720_o
The lake is in the middle section.
26738753918_7c11a44a67_o
Going further, there is Lord Hanuman temple. It is completely covered, may be to protect it due to construction work happening.
40610558241_075f6c8f28_o
Just ahead, there is another small lake.
25739936627_e37f377071_o
A remnant of old structure.
39899477684_aa3c535119_o
Then comes the huge cannon, called Laxmi Toph. There are many other cannons on the fort.
38800937680_d8d3cc95a4_o
39715601445_6be21ae10a_o
Going ahead, there is a Goddess Koraimata temple. The fort is named after this goddess.
40574002152_64a76e8a89_o
Towards bastion on the south direction, there is a fortification with steps.
26744547048_4dbe6281f8_o
A gate on the southern side.
25745618617_9ec0fa8a64_o
We reached southern side of the fort. The bastion here is still in good condition.
40574193032_749de926cd_o
From here, we could see bird’s eye view of surrounding.
38806357940_f2a79bf521_o
You can go down from this side which probably is the second route to get on this fort.
38806366100_902a641ebe_o
The steps are so small that I could hardly pass through.
38806410960_140fc47cd8_o
I could go half the distance but later path is in very bad state, so I did not continue.
39720838785_2f450ab896_o
After an hour’s of exploration, we returned to starting point and started descend. There is a huge gate called Ganesh Darwaja.
40616109681_a3b3bb8b0e_o
Going further down, there is a cave.
38806521840_ddd777c251_o
A water tank on the way.
38806593200_d1105cc1fc_o
39720991035_df838befe5_o
Also there is a Lord Ganesh temple.
26744801888_4ede827080_o
There is a secret cave as we reached mid way.
26744812818_f16cd1d12b_o
40574384382_6e682ab8e7_o
We came down in 30 minutes and saw this information board of the fort.
39721186115_32431afe01_o
The crane like structure to move construction material on the fort. They even carried a tractor up on this setup.
26745077568_b035370d12_o
25746228427_2f0287c725_o
A forest trail walk for 15 minutes took us to village.
40616417701_a1dcfa9fe0_o
A mobile tower on the way.
25746277207_788546a744_o
T

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...