Tuesday, February 15, 2022

शेलारवाडी लेणी(घोरावडेश्वर)

         पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या अगदी सीमेवर असणा-या आणि सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेल्या मावळ तालुक्याला निसर्गाचं अप्रतिम देणं लाभलं आहे. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती कायमच या भागाला मिळत आली आहे. वीकेंडला म्हणजेच शनिवार, रविवार किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी मुंबईहून लोणावळा, खंडाळा, कार्ला अशा ठिकाणी येणा-या पर्यटकांची गर्दी ही नेहमीच दिसत असते. किंबहुना वीकेंडसाठी लोणावळा, खंडाळा ही साधीसोपी आणि सहजपणे पाहता येणारी ठिकाणे असल्यामुळे येथे नेहमीच गर्दी होत असते. येथला निसर्गही आल्हाददायक आहे. त्यामुळे भटकंतीसाठी वेगळीच मजा आहे. परंतु गर्दीच्या वातावरणात येथील एखादे ठिकाण आपल्याला मुक्तपणे किंवा व्यवस्थितपणे पाहता येते का..? हा प्रश्न खरं तर ‘नाही’ या उत्तरानेच संपत असतो. म्हणूनच फिरण्याचा निवांतपणा अनुभवण्यासाठी या गर्दीतली काही दर्दी पावले आजूबाजूला आणखी काही अनवट ठिकाणे आहेत का? याचाही अप्रत्यक्षपणे शोध घेत असतात. यातली आनंदाची बाब म्हणजे अशी ठिकाणे आजूबाजूला आहेत, परंतु ती तितकीशी प्रकाशात आलेली नाहीत, हे खरं तर अशा ठिकाणांपेक्षाही आपलंच दुर्दैव म्हटलं पाहिजे.
        मुंबई-पुणे महामार्गावरून आपण प्रवेश करतो मावळ तालुक्यात. या मावळ तालुक्यात शिवकाळाचा भौगोलिक भाग असलेल्या बारा मावळांपैकीच पवनमावळ, आंदरमावळ आणि नाणेमावळ हा मावळी भाग आजही तितकाच इतिहासाने ठासून भरलेला वाटतो. याच मावळ भागातून वाहत गेलेल्या पवना आणि इंद्रायणी या जीवनदायिनी नद्यांमुळे हा भाग आणखीनच सुजलाम सुफलाम झाला आहे. स्वराज्यासाठी आपले महत्त्वाचे योगदान देणारी तुंग-तिकोणा, लोहगड, विसापूर, राजमाची आदींसारखी दुर्गरत्ने याच भूमीत उभी आहेत, तर कलेने समृद्ध असलेल्या कार्ला, भाजेसारख्या लेण्या तर यापूर्वीच सर्वाच्याच पसंतीस उतरलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईहून घाटमाथ्यावर आलो की ही सारीच ठिकाणे आपल्याला भावविवश करतात. परंतु या सा-यांपेक्षाही इथे असलेली काही अपरिचित आणि तितकीशी प्रसिद्ध नसलेली ठिकाणेही आवर्जून पाहावी याच पंक्तीतली आहेत. यातीलच सुंदर ठिकाणे म्हणजे बेडसे आणि घोरावडेश्वरची लेणी! यातल्या बेडसे लेणीला मुख्य रस्त्यापासून थोडेसे आत जावे लागते, तर घोरावडेश्वरची लेणी मात्र अगदी महामार्गावरच उभी आहेत. त्यामुळे या लेण्यांना जायचे कष्टही पडत नाहीत.आवर्जून पाहावीत अशी ही लेणी आहेत. कार्ला, भाजे, बेडसे यासारख्या लेण्यांची कलाकुसर, नजाकत भलेही येथे दिसत जरी नसली तरी हिचे प्राचीनत्व आणि कातळकला कुठेही कमी नाही. उलटपक्षी येथले मोठे शैलगृह आणि शिलालेख ब-यापैकी शाबूत आहेत. 
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर देहूरोड सोडल्यावर किंवा मुंबईकडून येताना तळेगावची खिंड ओलांडल्यावर एक मोठा डोंगर नजरेस दिसतो तोच हा घोरावडेश्वरचा डोंगर. डोंगर बराच मोठा असून या डोंगरात कालांतराने महादेवाचे मंदीर दिसून येते. या गुंफांमध्ये संत तुकाराम महाराजांचे वास्तव्य होते.घोरावडेश्वर डोंगराची हीच रांग पुढे घोरवडेश्वर, देहूरोडची अय्यप्पा टेकडी अन निगडीची दुर्गा टेकडी असे पल्ले गाठते. वायव्येला कुंडेश्वर - तासूबाई शिखरं, उत्तरेला भंडारा - भामचंद्र लेणी, तर दक्षिणेला पुरंदर - कानिफनाथ - सिंहगड - राजगड - तोरणा असे तालेवार डोंगर खुणावतात.
भौगोलिक स्थान (Location) –
      समुद्रसपाटीपासून सुमारे  ४५० ते ५०० मी उंच असलेला हा डोंगर. सध्या डोंगरावर जाण्यासाठी पायºया बांधलेल्या आहेत. खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही चांगलीच दमछाकच होते. पायथ्यापासून वर चढण्यास सुमारे २० ते २५ मिनिटे लागतात. वाटेत सुमारे २२५ पायºया चढून गेल्यावर पायºयांचे काम अर्धवट सोडून दिलेले दिसले. १० ते १५ वर्षांपूर्वी डोंगरावर जाण्याकरिता पाऊलवाट होती. त्यामुळे डोंगरावर जाण्यास चांगली दमछाक  व्हायची. अर्थातच हौशी पर्यटकांची वर्दळ कमी होती.  सरळ मार्गाने न जाता डोंगरच्या पाऊलवाटेने गेलो तर १० मिनिटातच वर पोहचतो. वाटेतून जाताना येथून दिसणारा परिसर मोठा सुंदर दिसतो.

घोरावडेश्वर लेण्यांसाठी तीन पर्याय उपलब्ध आहे. 
  १) यातील पहिला पर्याय म्हणजे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील तळेगाव पार करून सोमाटणे फाटय़ाच्या पुढे यायचे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर सोमाटणे फाट्याच्या टोलनाक्याच्या अलिकडे दोनेक कि.मी. वर घोरवडेश्वरचा पायथा आहे. ’उजव्या बाजूला घोरावडेश्वर नावाचा फलक मात्र आपल्याला थांबवतो. या फलकाच्या मागेच वर डोंगरावर जाण्यासाठी पाय-याही दिसतात. त्यामुळे हे ठिकाण अगदी रस्त्यावरूनही सहज ओळखू येते.
२)  दुसरा मार्ग म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाने सोमाटणे येथे बाहेर पडून जुन्या मार्गाने घोराडेश्वरच्या पायथ्यालाच यायचे. 
३) तिसरा मार्ग म्हणजे मुंबई- पुणे लोहमार्गावर बेगडेवाडी नावाचे रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर उतरून पायी दहा मिनिटातच घोरावडेश्वरचा पायथा गाठता येतो.
     तीनही मार्ग सोपे, सुटसुटीत आहेत. वरीलपैकी कुठल्याही मार्गाने एकदा का पायथ्याला आलो की आपल्यासमोर डोंगरावर जाण्यासाठी दोन पर्याय उभे राहतात. एक पाय-यांचा सरळ धोपट मार्ग आणि दुसरा डोंगरावर जाणारी छोटी पायवाट. 
पाय-यांचा मार्ग हा आबालवृद्धांसाठी सोयीचा तर रानवाट ही दर्दी भटक्यांसाठी सवयीची!थेट खिंडीचा रोख धरून पाऊलवाट तुडवायला जायला आवडते त्यांना तो पर्याय आहे. गिर्यारोहकांच्या सरावाचे कातळ अन अर्धवट खोदलेल्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूनं झाडीतून उभी वाट चढते. 
बहुतेकांना अमरजाईच्या देवळाअलीकडची धोपट वाट बरी वाटते. निसर्गमित्र संस्थेच्या प्रयत्नामुळे थोडकी झाडं जगली आहेत. जमलं तर माथ्याजवळच्या झाडांसाठी पाण्याचा एखाद कॅन घेऊन चढू लागायचं. खुणेच्या पिंप्रीच्या झाडाजवळून वीस-पंचवीस मिनिटांत आपण माथा गाठतो.
गारोडी’, ’गरोडी’ किंवा 'शेलारवाडी लेणी' या नावाने देखील ओळखला जाणारा हा डोंगर. दक्षिणेला पायथ्यापासून १५० मी.(५०० फूट) उठावलेल्या डोंगरमाथ्यावर झेंडा फडकताना दिसतो. डावीकडे उंच टेपाड अन उजवीकडे जरा बुटकं टेपाड अश्या जोडशिखरांचा हा डोंगर म्हणजेच आपलं गन्तव्य.अनेकांना या डोंगराचे नाव घोरावडेश्वर की शेलारवाडीची लेणी असा प्रश्न पडतो. लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडी गावामुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणू लागले. खरे पाहता ही लेणी पायथ्याच्या शेलारवाडीला चिकटून आहे. संपूर्ण डोंगरावर अग्निजन्य खडक विखुरलेले दिसतात. स्पटिकरुपी असलेले हे छोटे दगड लाखो करोडो वर्षापूर्वी या डोंगराची निर्मिती कशी झाली याची साक्षच देतात.

कसे जाल :

  • पुण्यातून अथवा लोणावळ्याकडून रेल्वेने आल्यास बेगडेवाडी हे रेल्वे स्थानकावर उतरून डोंगरावर जाता येते. मात्र रेल्वे स्टेशनापासून डोंगर सुमारे २ ते ३ किलोमीटर आहे. पायी चालण्याशिवाय पर्याय नाही.
  • स्वत:चे वाहन घेऊन आल्यास पुण्यातून येताना देहूरोड सोडल्यावर देहूरोड बायपासच्या थोडे पुढे घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी गाडी लावून जाता येते.
  • मुंबई बाजूने आल्यास तळेगावची खिंड ओलांडल्यावर डाव्या बाजूला भव्य गणपती दिसतो. तेथून पुढे घोरावडेश्वराला येता येते.
  • पुणे ते घोरावडेश्वर अंतर सुमारे ३५ किलोमीटर.
  • हॉटेलची सोय आहे. जवळच पेट्रोलपंप सद्धा आहे.
पहाण्यासारखी ठिकाणे –
    समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात ही लेणी खोदलेली आहेत. वर जायला उत्तम पायर्‍या बांधलेल्या आहेत पण खडी चढण असल्याने उंची फारशी नसूनही काहिशी दमछाकच होते.लेण्यांमध्ये असलेल्या शिवमंदिरामुळे तसेच येथून जवळच असलेल्या घोरावाडीमुळे या लेण्यांना घोरावडेश्वर असेच म्हणतात पण वास्तविक ही लेणी आहेत पायथ्याच्या शेलारवाडीला खेटून.
ghorwadeshwar cave temples near Somatane

ghorwadeshwar cave temples near Somatane

ghorwadeshwar cave temples near Somatane

ghorwadeshwar cave temples near Somatane

     घोरवडेश्वरच्या डोंगराचं रुपडं खरं पालटतं ते पावसाळ्यात ! आग ओकणा-या सूर्यनारायणाच्या दाहातून क्ळाकळा तापलेल्या भुमाता सुटकेचा निश्वास सोडते ते जेष्ठाच्या पहिल्या सरी बरसल्या कि. एरवी उंच आभाळात वाकुल्या दाखवत जाणारे मेघ आता मात्र घोरवडेश्वरच्या माथ्याला टेकून बसतात. 
         हा डोंगर श्री घोरवडेश्वराच्या देवस्थानामुळे सुपरिचित असला, तरी ही मुळात हिनयान बौद्ध लेणी (म्हणजे मूर्तीपूजेऐवजी बुद्धाची चिन्हरूपाने पूजा करणा-यांची) आहेत. नालासोपारा सारख्या प्राचीन बंदराकडून कोकणपट्टी पार करून पांथस्थ कोंडाणे लेण्यात विश्रांती घेत असतील. द्वारपाल राजमाची किल्ल्याच्या परवानगीनं कोकण दरवाजा किंवा बोरघाटाने घाटमाथा गाठून कार्ले-भाजे-बेडसे अश्या निसर्गरम्य लेण्यात मुक्काम करत असतील. लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना अश्या दुर्गाचं संरक्षण असल्याने व्यापार अन धर्मप्रचारात अडथळा येत नसेल. पुण्याच्या दिशेनं प्रवास करताना घोरवडेश्वर-भंडारा-भामचंद्र अशी बौद्ध लेणी दिमतीला असतील... प्राचीन काळच्या व्यापारी वाटा, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनात दुर्ग आणि पांथस्थांच्या विश्रांतीसाठी अन धर्मप्रचारासाठी खोदलेली कातळकोरीव लेणी अश्या नेहमीच्या ’घाटवाट-दुर्ग-लेणी’ जोड्या शोधताना मजा वाटते.
शेलारवाडीची लेणी-बौद्धधमार्तील हिनयान पंथीयांनी इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स. नंतरच्या पहिल्या शतकात खोदल्या. ११ लेण्यांचा हा छोटासा समुच्चय. बेडसे, भाजे, कार्ले, भंडारा या डोंगरावरील बौद्धकालिन लेण्या या काळच्या. बौद्धकालिन असलेल्या या लेण्या खोदण्यासाठी पूर्वी राजे, व्यापार्‍यांकडून अनुदान दिले जात असते. बहुधा या लेणीसाठी निधी अभावी कमी नक्षीकाम व विहार बांधलेले दिसून आले. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना आहे. 
ghorwadeshwar cave temples near Somatane

ghorwadeshwar cave temples near Somatane

    
मुळात घोरावडेश्वरची प्राचीन बौद्धलेणी ही दोन डोंगरांच्या बेचक्यात बसली आहे. त्यामुळे दोन डोंगर जेथे मिळतात, तिथेच या दोन्हीही वाटा येऊन मिळतात. भौगोलिक भाषेत या जागेला ‘खिंड’ असे म्हणतात. या खिंडीतच भारतीय पुरातत्त्व विभागाने या लेण्यांसंबंधीचा फलक लावला आहे. या जागी आलो की, मग निसर्गाचा आणि मावळ भागाचा सुरेख नजाराच आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. खिंडीतूनच लेणीची भटकंती सुरू करायची. एक वाट डावीकडे जाते. याच मार्गावर वरील बाजूस दगडात आणखी एक विहर आणि त्याच्याकडे जाण्यासाठी पाय-या खोदलेल्या दिसून येतात. तसेच याच्याच खाली काजळकोरी व पाण्याचं टाकही दिसते. हे ओलांडून आपण मुख्य लेण्यांसमोर पोहोचतो.  

चैत्यगृहाशेजारील शिलालेख कोरलेला विहार

पूर्वीचे चैत्यगृह, आजचे शिवमंदिर

चैत्यगृहातील सभामंडपातील कक्ष

घोरावडेश्वर महादेव

 शिवलिंगाच्या वर दिसत असलेली हर्मिकेची चौकट

छोटय़ा दगडी दरवाजातून आत आलो की आपण अक्षरश: स्तंभित होऊन जातो. आत प्रशस्त सभागृह असून याच्या दोन्ही बाजूला लहान खोल्या खोदलेल्या दिसतात. या लेणीतले शैलगृह आजूबाजूच्या लेण्यांपेक्षाही बरेच प्रशस्त आहे. एक चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी इतर लेण्यांसारखीच इथलीही रचना आहे. डावीकडच्या पहिल्या विहारामध्ये आता विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. काही विहार थोडेसे उंचावर खोदलेले दिसून येतात. आतमध्ये राहण्यासाठी छोटे कक्ष, झोपण्यासाठी खोदलेले ओटे अशी रचना आहे. माथ्यावर पोहचल्यावर उजवीकडच्या बाजूला एका विहाराशेजारीच येथील एकमेव चैत्यगृह आहे. आज तेथे शिवमंदिर आहे. हाच येथील घोरावडेश्वर महादेव. 

तिथल्या कक्षावर असलेला कोरीव लेख

मंदिराच्या आत एक ब्राह्मी प्राकृतात एक शिलालेख कोरलेला दिसून येतो. बाहेरील शिलालेखात कोरलेला मजकूर याप्रमाणे.

सिधं धेनुकाकडे वायवस
हालकियस कुडुबिकस उसभ
णकस कुडुबिणिय सिअगुत
णिकाय देयधमं लेणं सह पुते-
ण णं(द)गहपतिणा सहो

धेनुकाकट येथे वास्तव्यास असलेल्या शेतकरी असलेल्या ऋषभनकाची पत्नी श्रीयगुप्ती हिने हे लेणे गृहपती असलेल्या आपल्या नंद नावाच्या पुत्रासह धर्मार्थ दान केले आहे.धेनुकाकट ही तत्कालीन बौद्ध संघाची वस्तू. कदाचित आजचे डहाणू. आंध्रप्रदेशातही सातवाहनांचे धेनुकाकाट्क(धन्यकाकाटक) नावाचे एक शहर होते. प्रस्तुत शिलालेखातील धेनुकाकट नेमके कुठले याचा उलगडा होत नाही. हालिक म्हणजे हल-नांगर धरणारा अर्थात शेतकरी. म्हणजे सामान्य जनतेचाही लेणीनिर्मितीस हातभार लागलेला होता हे येथे स्पष्ट होते. कार्ले येथील लेखांमध्येदेखील असाच उल्लेख आढळतो. ’धेनुकाकट’ हे लेणी समूहाच्या परिसरातील बौद्ध-ग्रीक व्यापार्‍यांच्या तत्कालीन वसाहतींचे नाव होते, असे अनुमान काढतात.(संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटियर)

हे चैत्यगृह अगदी साधे दिसते. सभामंडप, त्यात विहार आत मध्ये ओटे आणि आत गर्भगृह अशी याची रचना. मूळच्या स्तूपाची हर्मिकेची चौकटही दिसते. हर्मिका म्हणजे स्तूपाच्या वर असलेली चौकट अशी चौकट कार्ला येथील लेण्यांमध्ये पाहावयास मिळते. इथल्या चैत्यगृहाची उंची कमी असल्याने इथे गजपृष्ठाकृती छत, लाकडी फासळ्या इ. दिसून येत नाहीत. हर्मिका छताला अगदी भिडलेली आहे.
   सध्या या विहरात विठ्ठल-रखुमाई व तुकाराम महाराजांच्या मूर्त्यां ठेवलेल्या दिसून येतात.  येथे वारकरी समाजापैकी काही साधक चिंतन, मनन करताना दिसतात. परंतु या मूर्तीच्या मागेच काताळातल्या भिंतीवर तीन अनामिकांच्या आकृत्याही कोरलेल्या स्पष्टपणे दिसून येतात. हा बदल शिवकालानंतरच झाला असणार. तुकारामांनतरच हे निश्चित. इथले शिवलिंग कदाचित शिवकालाच्याही आधीचे असावे पण विठोबा-रखुमाई अगदी अलीकडच्या, कदाचित १८ व्या १९ व्या शतकातही कोरलेल्या असाव्यात.कोरलेल्या मूर्ती त्यांच्या कोरीव कामावरून तरी फारश्या जुन्या वाटत नाहीत. साहजिकच आहे की तुकारामांना संतपद मिळाल्यानंतरच्याच काळातील त्या आहेत. शिवाय विठ्ठलाच्या घडीव मूर्ती तर अगदी अलीकडच्याच म्हणजे जेमतेम ३०/४० वर्षांपूर्वीच्याच वाटतात. घोरावडेश्वर महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना मात्र कधी झाली असावी ते सांगता येत नाही.खुद्द देहूनजीकच्या तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर पलीकडच्या बाजूने खालच्या पातळीत अशीच कोरीव लेणी आहेत. तिथे फारसे कुणी जातही नाही. तिथे एक स्तूपही आहे. तिथल्याही एका विहारात विठ्ठ्ल रखुमाईच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. पाण्याची टाकी पण आहेत.

      हे शैलगृह प्रशस्त आयताकृती आहे. जमीन समतल आहे. पूर्वीच्या ’दागोबा’च्या जागी उत्तर काळात ’श्री घोरवडेश्वरा’ची स्थापना करण्यात आली आहे. ’श्री घोरवडेश्वरा’च्या अंधार्‍या देवालयात (शैलगृहात) आता वीज आली आहे. इथलं देवस्थान जागृत मानतात. हे शिवलिंग येथील पंचक्रोशीतल्या नागरिकांमध्ये अत्यंत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे येथे भक्तांची तसेच नागरिकांचीही ब-याच प्रमाणात गर्दी दिसून येते. याशिवाय महाशिवरात्रीला तर येथे मोठी यात्राच भरते. आपणही दर्शन करून बाहेर यायचे.

 या लेणीपर्यंत वाट ब-यापैकी रुळलेली आहे. किंबहुना अनेक भक्त, पर्यटक येथपर्यंतच आपली भटकंती पूर्ण करतात. 

   


ghorwadeshwar cave temples near Somatane
 चैत्यगृहाच्या पुढे एक विहार व एक पाण्याचे टाके असून त्यापुढे कड्याला लगटून चालत गेल्यास वरच्या बाजूला एक बर्‍यापैकी प्रशस्त विहार खोदलेला आहे. पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी छोटेसे प्रस्तरारोहण करून वर जावे लागते.या पाय-यांनी थोडी सावधपणे चढाई करावी लागते. कारण ही चढाई ब-यापैकी काटकोनात आहे व यात थोडीशी जरी चूक झाली तरी खाली दरीत कपाळमोक्ष ठरलेला आहे. या वाटेवर पावसाळ्यात पाणी व शेवाळे असल्याने, पर्यटकांनी जपून जावे.

कातळारोहण करून गेल्यावर वरच्या टप्प्यात असलेला प्रशस्त विहार

विहारात असलेले ऩक्षीकामाने सजलेले कक्ष.

 स्तंभांवर कोरलेली गजशिल्पे.

या खोलीच्या दाराजवळ व पायापाशी असे शिलालेख आहेत. (या लेखाचा उजवीकडील भाग नव्या लोखंडी दरवाज्याच्या सिमेंटमुळे लुप्त पावला आहे.) ‘(शके) १३६१ सिद्धार्थी संवत्सरे श्रावण शुद्ध’ या लेखात इ.स. १४३९ (१५ वे शतक) मध्ये श्रावण शुद्ध अष्टमीला जेंव्हा या लेण्यांचे ‘रुपांतर’ करण्यात आले, त्याचा उल्लेख आहे. (संदर्भ: महाराष्ट्र शासन गॅझेटियर)ghorwadeshwar cave temples near Somatane

ghorwadeshwar cave temples near Somatane

ghorwadeshwar cave temples near Somatane


इथली गुहा बर्‍यापैकी मोठी असून विहारातील खोल्यांमध्ये गणपती, शिवलिंग, देवी इत्यादींची स्थापना झालेली दिसते. खिंडीतून पश्चिमेला (उजवीकडे) गेल्यावर कातळात थोड्या उंचावर दोन विहार अन कोरीव कोनाडे दिसतात. पाण्याच्या पोढी (टाके) पासून आपण येतो मुख्य चैत्यगृहापाशी पोहोचतो. लेण्यांचा दर्शनी भाग कोसळल्यामुळे, बाहेरून जाड भिंत बांधली आहे.शेजारी कुठल्या महाराजांची पाटी दिसून आली. सध्या येथे कुणी राहत नसल्याचे दिसून येते. पुरातत्व विभागाने येथे बांधकाम कसे करू दिले हा प्रश्न पडतो.  

इथल्या लेणीमध्ये जे थोडेफार अलंकरण दिसते ते इथेच. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात व सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. अर्थात नक्षीकाम तसे ओबडधोबडच आहे. ओसरीवरील स्तंभांवर हत्ती कोरलेले दिसतात. सबंध विहारावर चौकटीचे नक्षीकाम केलेले दिसते. खांबविरहीत या शैलगृहाला खोल्यांच्या भिंतीवर कोरलेल्या अर्धअष्टकोनी स्तंभांच्या जोड्यांवरील कोरीव-खोदीव, ओबड-धोबड हत्ती व सिंहांनी पेलले आहे. (येथे अजिंठा किंवा अंकाई लेण्यांमधील शिल्पं आठवतात.) स्तंभांचे पाय कुंभाकृती आहेत.
या विहाराच्या बाहेर दोन नंदी दिसतात. एक जुना व दुसरा नवीन कोरलेला.
पश्चिम डोंगरावर एक, वायव्य उतारावर एक गुहाटाके, उत्तर उतारावर एक, माथ्यावर एक, पश्चिम उतारावर एक आणि पूर्वेकडे दोन अशी विपुल टाकी आढळतात.अगदी मे महिन्यात देखील येथील पाण्याची टाकी पाण्याने चांगलीच भरलेली असतात. पाण्याचे नियोजन आपल्या पूर्वाजांनी एवढे चांगल्यारित्या केले आहे. मात्र आज महाराष्ट्रातील अनेक खेड्यात पाण्याच्या थेंबासाठी मारामारी पाहताना दिसून येते. अवघड आहे. असो.
वरून दिसणारा निसर्गरम्य देखावा

 येथून दिसणारा नजारा मात्र अवर्णनीय असाच आहे.  येथून पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे दिसतो. सुब्रतो स्टेडियम लक्ष वेधून घेते.
सोमाटणेफाटा येथे असलेली गजाननाची मूर्ती.

बिर्ला मंदिराकडून बांधण्यात आलेली सोमाटणे फाट्याजवळील भव्य गणेशमूर्ती दिसते.लेणीच्या खिंडीत उभे राहिले की एका बाजूला जुना मुंबई-पुणे रस्ता मार्ग आणि रेल्वेचा मार्गही दिसतो. दुस-या बाजूला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि सहारा क्रिकेट स्टेडियम या वास्तू आधुनिक विकासाची साक्ष पटविताना दिसतात. 
Ghoradeshwar Caves - view from temple top
घोरावडेश्वर डोंगरावरुन दिसणारे महामार्गाचे दृष्य
subrato roy cricket stadium view from Ghoradeshwar Caves
गहुंजे येथील सुब्रतो रॉय स्टेडीयम

या सा-या गोष्टींमुळे येथील नागरिकरणही झपाटय़ाने वाढले आहे. हा परिसर सुमारे अर्धा पाऊण तासात पाहून होतो. 
विसापुर आणि भातराशी डोंगर
सिंहगड उर्फ कोंडाणा

प्राचीन गुहेचा शोध :-
नुकतेच म्हणजे फेब्रुवारी २०१८ मध्ये घोरावडेश्वर परिसरात ६६ दश लक्ष वर्षापुर्वीच्या ज्वालामुखीजन्य गुहा सापडल्या. हे अभ्यासक आणि पर्यटकांसाठी नवीन आकर्षण निर्माण झाले आहे.
map to Ghorwadeshwar Caves vlocanic
इथे जाण्यासाठी मार्गाचा नकाशा
Ghorwadeshwar vlocanic caves
जिथे गुहा आहे त्या जागेचे GPS location of Ghorawadi Volcanic caves 18.689116, 73.708659
Ghorwadeshwar erosion of volcanic
या गुहेचे आकारमान आहे, अंदाजे २० मीटर लांबी, १४८ से.मी.उंच आणि ३१० से.मी.रुंद असे आहे.
ghorawadi volcanic caves inside
लावा रस थंड होताना नैसर्गिक कारणामुळे हि गुहा तयार झालेली आहे.आत जायचे तर बसूनच जावे लागते.
Ghorwadeshwar new caves
या गुहेचे संशोधन करत असताना इथे काही हाडाचे तुकडे सापडले.यावरुन इथे प्राचीन काळी मानवाचे वास्तव्य होते.फ्लोरीन डेटींग तंत्राचा उपयोग करुन त्याचा काल निश्चित करण्यात आला.
Ghorwadeshwar vlocano caves
या गुहेत कालौघात पाण्याचा मारा आणि नैसर्गिक झीज यामुळे बरेच बदल झालेत. घोरावडेश्वर परिसरात आदीमानवाच्या वावराचा पुरावा म्हणजे हि गुहा.
     हे सारे पाहून झाले की पुन्हा आल्यामार्गे खिंडीत यायचे. डोंगराच्या पोटात कोरलेल्या या लेण्या म्हणजे निसर्गप्रेमी आणि भटक्यांसाठी अनमोल खजिनाच आहेत. आधुनिकतेच्या या पसा-यात घोरावडेश्वराची लेणी मात्र एखाद्या स्थितप्रज्ञासारखी निवांत उभी आहेत. याच्या भवतालची झाडीही ‘शाबूत’ आहे. येथे येणा-या ब-याच जणांना ही प्राचीन लेणी आहेत हेच मुळात माहीत नाही. केवळ देवदर्शनासाठी येथे येणा-यांची संख्या जास्त आहे. पुरातत्त्व विभागाने फलक लावून स्वत:चे नेहमीचे काम करून हात झटकलेले दिसतात. त्यामुळे संवर्धनाच्या दृष्टीने आनंदीआनंद आहे.प्रत्येक ऐतिहासिक व बौद्धकालिन लेण्यांवर पुरातत्व विभागाची एक पाटी दिसून येते. मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत ही पाटी असते. लेण्यांविषयी माहिती देण्याची सोडून यावर लेणी परिसराचे विद्रुपीकरण केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. असी धमकीवजा विनंती लिहलेली असते. प्रत्यक्षात या ठिकाणी कोणी लेण्यांची नासधुस जरी केली ती कळणार कशी? कारण पुरातत्व विभागाचा कोणी माणूस अथवा चौकीदार येथे कुठेच आढळत नाही. नुसत्या पाटया लावून संवर्धन कसे होणार महाराष्ट्र शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
 घोरावडेश्वरच्या भेर्टीत बेगडेवाडी स्टेशनच्या मागे, इंद्रायणी नदीच्या पात्रात रांजण-खळगे आहेत. ते ही आवर्जून जाउन पहावेत.

भक्तांच्या वर्दळीमुळे ही लेणीही विजेचा प्रकाश आणि पाण्याची सोय आदी सुविधा घेऊन तितकीच खंबीरपणे उभी आहे. बरेच जण मुंबई-पुणे हा प्रवास करीत असतात. धकाधकीच्या, दगदगीच्या आणि कामानिमित्त केलेल्या या प्रवासात घोरावडेश्वरची लेणी मात्र तुम्हाला विरंगुळ्याचे चार क्षण निश्चितच देऊन जातील यात शंका नाही. यासाठी या महामार्गावर घोरावडेश्वरच्या स्टॉपवर एकदा तरी थांबले पाहिजे. अप्रतिम असे हे ठिकाण ‘लेणे’ म्हणून अपरिचित आहे. येणारे लोक ‘श्री घोरवडेश्वरा’चे दर्शन घेतात, पण लेणी मात्र दुर्लक्षित करतात. पुणे परिसरात चतु:शृंगी डोंगर, पाताळेश्वर, भंडारा डोंगर, येरवडा (गांधी स्मारक) येथील साधी शैलगृहे अभ्यासकांसोबत पर्यटकांनीही पाहिली पाहिजेत. 

अजुन काय पहाल :

  • डोंगराच्या पायथ्याजवळ अमरजाई मंदिर आहे.
  • बिर्लाचे गणपती मंदिर
  • शिरगावचे श्रीसाईबाबा मंदिर
  • कुंडमळा
  • श्री पार्श्वप्रज्ञालय (तळेगाव)
  • देहूगावातील गाथा मंदिर 

संदर्भ :-

१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) http://www.discoversahyadri.in/2014/04/Ghorwadeshwar.html
३)  www.ferfatka.blogspot.com.
४) https://trekbook.in/ghorwadeshwar-caves/
५) https://www.maayboli.com/node/43299
६) https://placesnearpune.com/2012/02/ghorwadeshwar-cave-temple/
७) https://prahaar.in
८) इये महाराष्ट्र देशी- प्र,के.घाणेकर


खुद्द देहूनजीकच्या तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर पलीकडच्या बाजूने खालच्या पातळीत अशीच कोरीव लेणी आहेत. तिथे फारसे कुणी जातही नाही. तिथे एक स्तूपही आहे. तिथल्याही एका विहारात विठ्ठ्ल रखुमाईच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. पाण्याची टाकी पण आहेत.


धेनुकाकट ही तत्कालीन बौद्ध संघाची वस्तू. कदाचित आजचे डहाणू. आंध्रप्रदेशातही सातवाहनांचे धेनुकाकाट्क(धन्यकाकाटक) नावाचे एक शहर होते. प्रस्तुत शिलालेखातील धेनुकाकट नेमके कुठले याचा उलगडा होत नाही




Ghorwadeshwar Caves – Visited Newly Discovered Volcanic Caves

Update 10 March 2018: Similar Volcanic caves found near Hinjewadi too, read more

Last month you must have heard about discovery of over 66 million years old lava cave at Ghorwadeshwar Caves [Ghorawadi].

Today I was at Ghorwadeshwar hills with my friends Anil & Doctor Pawar.

Anil was bit curious about these volcanic Ghorwadeshwar Caves and started beating around, he was suspecting caves location (here is a photo from the first spot we saw caves)


When we went ahead, a person called me since he was also going to the caves ! Bravo !!

Here is a photograph of location from where we got down to the ….

New Vlocanic Ghorwadeshwar CavesGhorwadeshwar spot where you have to get down

Once you get down for ~20 feet from the photo spot, you will see a light trail on left hand side going to the caves

For your convenience I have jotted down the GPS Coordinates of the caves

GPS location of Ghorawadi Volcanic caves 18.689116, 73.708659

(Since now people have started going there, a small trail has been created)


Doc posing at the mouth of volcanic cave

ghorawadi caves new

I did not measure it but it is said that the cave is ~20 meters length, ~148 cms height, ~310 cms width.

You have to sit down and crawl inside the caves.

It is a naturally formed lava cave from the Deccan Volcanic Province (DVP)

Research paper says that Ghorawadi Volcanic cave is formed by draining of a segment of lava tube forming lava distributaries. The roof of the cave entrance exposes a reddened glassy crust.

Erosion of the Ghoradeshwar plateau with isolated hill ranges has exposed this lava cave. The caves are modified over the years due to weathering and solution activity due to water seepage

A few small bone fragments collected from the fine-grained cave sediments of the cave, showing habitation evidence. Fluorine dating technique used to determine the relative age of these bones.

Here is a photo shot from inside the caves, these two small tube cavities inside …




 

Reference Article submitted to International Journal of Speleology

The genesis of a lava cave in the Deccan Volcanic Province (Maharashtra, India)

Read more about Gorawadeshwar temple and other treks you can do during visit


शेलारवाडीचा घोराडेश्वर


 ५ लेख ९ लेण्या १ वृक्षारोपण

सुटीच्या दिवशी फिरायला येणार्‍यांची येथे गर्दी


पापाची ही व्याख्या जरा वेगळी आहे. ते एक छानसे टूमदार 

ठिकाण. ते न बघता पुणं सोडलं असतं तर ते पाप ठरलं असतं. 

एक शक्ती आपल्या सोबत असते, जी आपल्या हातून असं पाप 

घडू देत नाही. मावळाचा आरंभी डोंगर तळेगाव दाभाड्याचा 

शेलारवाडी किंवा घोराडेश्वर नावाने ओळखला जाणारा. खरे तर 

तिथे गेल्या पाच एक वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षारोपणाचे काम 

बघण्यासाठी तो बघायचा होता. त्यावर काही लेणी आहेत, हे 

ठाऊक होतं, पण ती ईतकी जुनी असतील, इतकी छानशी 

असतील याची कल्पना केली नव्हती. हा समूह न बघता 

नासिकला गेलो असतो तर ते पाप ठरलं असतं!

अंधश्रद्धा पाळणे जेव्हा लाभदायक असते तेव्हा ती जरूर पाळावी. ज्या ठिकाणी एखाद्या समारंभाच्या निमीत्ताने जाण्याचा योग येतो त्यावेळेला तिथल्या प्रमुख देवालयाला भेट द्यावी हा शिरस्ता जसे काही जण पाळतात, त्याच पद्दतीने तिथले डोंगर आणि त्यावरची जैविक, पुरातत्वीय संपदा पहावी, गड असेल तर तो जरूर पहावा हा शिरस्ता माझ्यापूरता मी सांभाळला आहे. तो चुकला तर माझ्या कामात गती येत नाही, ही श्रद्धा पाळली आहे, अंध असली तरीही. ३१ जानेवारीला या अंधश्रद्धेचा लाभ म्हणजे वृक्षरोपण करून जीवापाड जपलेला १ डोंगर, ५ लेख, ९ लेण्या.

एका कौटुंबिक समारंभा निमीत्त पुणे भेटीचा योग आला. 

नात्यातील नावे कसोशिने लक्षात ठेवूत

समारंभाचे सोपस्कार सर्व पार पाडत

तीन दिवसांचा खासा पाहूणचार झोडत,

'आता गरिबावर द्या करा', 

हा अविर्भाव चेहेर्‍यावर दाखवला तेव्हा अर्धा अर्धा दिवस भटकंतीची परवानगी मिळाली. पहिला अर्धा दिवस पाय तुटेस्तोवर राजा दिनकर केळकर पुराणवस्तू संग्रहालय नजरेखालून घातले. दुसर्‍या अर्ध्या दिवसासाठी अनेक विविध पर्याय समोर येत असताना, ती शक्ती कामी आली जिने शैलारवडीच्या लेणी चुकविण्याचे पाप हातून घडू दिले नाही.

पुण्यातला ब्लॉगर मित्र विनित दाते हा नेहमी सुटीचा दिवस घोरेडेश्वराच्या डोंगरावर वृक्षारोपणासाठी जातो. त्याच्या संवर्धनकार्याची माहिती अधून मधून कानी पडते. त्याला अर्धा दिवसाच्या भटकंतीबद्दल विचारले तर त्याने धोराडेश्वराला जाऊ. तासाभरात पाहून होतो. नाशिकला परतताना तो पाहूनच परतावे, असा प्रेमळ सल्ला दिला. असा सल्ला थोडाच मोडवतो. मी रहायला कोंडव्यात, हा डोंगर निगड्यात मावळात. पुण्यातल्या एका भटक्या दोस्ताला साद घातली. रविवार कामाचा  व्याप असूनही तो सकाळी पटकन जाऊन येऊ म्हणत तयार झाला. 

पुण्यापासून ४० किलो मिटर अंतरावर पुणे मुंबई महामार्गावर तळेगाव-दाभाडे येथे पोहोचायला साडे सात वाजून गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या. ही वाहने धावती नव्हती, तर तर डोंगरभेटीसाठी आलेल्या हौशी पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली होती. 'प्रशस्त महामार्ग असूनही भल्या सकाळी वाहन उभे करायला जागा मिळू नये', यावरून हा डोंगर सुद्दा नाशिकच्या पांडवेणीच्या डोंगरासारखा तर नसेल ना? असे उगिचच वाटून गेले. महाराष्ट्रात अलिकडच्या काळात साप्ताहिक पोय मोकळे करण्याच्या मोहिमेने जोर धरला आहे. कार्यालयात कामात गढून पिचून गेलेल्यांची रोजच्या वाहतूक वर्दळीत हवापालट करण्याची घरालगतची जागा ही शहराजवळच्या लहानशा डोंगरावर बघायला मिळते तसाच हा प्रकार.

।।रान राखावे रान जोखावे रान मेळवावे परोपरी।।  निसर्गमित्रचे स्वयंसेवक वृक्षसेवेचा जयजयकार करताना

।।रान राखावे रान जोखावे

रान मेळवावे परोपरी।।

निसर्गमित्रचे स्वयंसेवक वृक्षसेवेचा जयजयकार करताना

डोंगर पायथ्यापासून थोडे दूर गाडी उभी करून विनित आणि राहुल कोरे असे आम्ही तिघे डोंगर चढू लागलो तसा मीच विषय छेडला, डोंगरावर आज गर्दी लोटलेली दिसते, काही डोंगर हे गर्दीछाप लोकांसाठी मोकळे ठेवावे, त्यांना तरी निवांतपणे कुंठे अनूभवता येणार? अशी मंडळींपासून जर काही उपद्रव होणार असेल तर ज्या डोंगरावर जैवविविधता नाजूक अवस्थेत आहे, ज्याठिकाणी पुरातत्वीय अवशेषांची दूरावस्था आहे, असे डोंगर, लेण्या, किल्ले त्याने वाचविले जाऊ शकतील. काही ठिकाणे ही आम जनतेसाठी खुली असायलाच हवीत.विनितच्या नजरेत, हा गर्दीसाठी हवा की नको, असे कोणतेच भाव वाचायला मिळाले नाही. तो फक्त माहिती देत गेला, याठिकाणी अगोदर फक्त आणि फक्त गवतीमाळ होता. निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागाने येथे वृक्षारोपणाची मोहिम हाती घेतली आणि याचे रूप पालटायला सुरूवात झाली. मागिल पाच वर्षांत झाडे लावण्याच्या मोहिमेने वेग धरला आहे. कार्यकर्ते सुट्टीच्या दिवशी येऊन झाडांची निगा राखतात. नऊ हजारच्या वर झाडे लाऊन झालीत. ती जगविण्याचे काम सुरू आहे. एक एका  टप्प्यावर निसर्गमित्रचे कार्यकर्ते भेटत होते. हे काम बघण्यासाठी नासिकवरून आलोय हे कळताच त्यांचाही आनंद दुणावत होता. याठिकाणी पाण्याची टाकी बसवली होती, तिला काणी तरी भोक पाडले. या ठिकाणी काडी टाकून गवत जाळले. या ठिकाणी हा कचरा, त्याठिकाणी तो युगुलांचा ससेमिरा, त्या पलिकडे मद्यप्रेमींनी सोडून गेलेल्या पाऊलखुणा. 

''लोकांसाठी...त्यांच्या गर्दीसाठी...आखडलेल्या पायांसाठी...मोकळे मन करण्यासाठी'', घोराडेश्वरचा डोंगर असावा? या माझ्या विचारांना, नको नको...'तो नसावा', अशी कलाटणी खायला सुरूवात केली.

गर्दी थांबविणे आपल्या हातात नाही. ती आपण नियंत्रीत करू शकत नाही. 

लोकांनी असे चालावे, तसे चालू नये

हे करावे, ते करू नये

या दिवशी यावे, त्यादिवशी येऊ नये

असं वागावं, तसं वागू नये...

हा आपला दृष्टीकोण कितीही भल्या विचारांवर आधारलेला असला तरी प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. जिथे कोणालाच थांबायचं नसतं तिथे 

अशी माणसे निसुन तरी काढावी कशी? 

बंदीचे अस्त्रही जिथे कुचकामी ठरते तिथे लोकांची गर्दी नियंत्रित करावी तर ती कशी? 

इथे येणारे मुळातच सगळेच वृक्षप्रेमी नव्हेत, इतिहास अभिमानी असतीलही पण इतिहासप्रेमी नव्हे. त्यांची छाटणी कशी करणार. वनविभागाने येथे प्रवेशावर बंदी टाकून बघितली. पण तो प्रयोग यशस्वी ठरला नाही. एकवर्ग संवर्धन, प्रबोधन वगैरे करतोय तर एक वर्ष याच्याशी काहीही देणे घेणे नसलेला. त्यांना एकतर त्यांचा त्यांचा आनंद साजरा करायचा. कोणाला तर सेल्फी सारखी छायाचित्रे काढून घ्यायची. कोणाला प्यायचं, कोणाला कोणाला आणून नुसतं हिंडवायचं.

या संघर्षात झाडांची ज्या वेगाने वाढ व्हायला हवी तितक्या वेगाने ती होत नाही. पण त्याने निसर्गमित्रच्या कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही. त्यांच्या अथक श्रमामुळे घोराडेश्वराच्या डोंगराला वैभव प्राप्त होत आहे. लेण्याकडचा डोंगराचा भाग हा जसा लोकप्रिय तसाच वृक्षरोपणाकडचा भाग लोकांमध्ये आकर्षणाचा विषय ठरला आहे.

जमिनीच्या पोटात खोदलेल्या सातवाहन कालीन टाक्याची खिडकी

महाराष्ट्रातल्या अनेक डोंगराप्रमाणे ही डोंगर देखिल चहुबाजूंनी गिरीपुष्पाने वेढलेली आहे. हे न केवळ विदेशी प्रजातीचे झाड त्याचे पर्यावरण साखळीवर प्रतिकुल परिणाम दिसून आले आहेत. ग्लिरिसिडीया झाडांच्या कचाट्यात इतर बहुतांशी झाडे जगू शकत नाहीत. या झाडांवर पक्षी येत नाहीत. त्यांची सावली धरत नाही, त्यामुळे त्यांच्या परिसरातली जमिन ही उन्हामुळे कडक होऊन जाते व त्यात जमिनीचे पर्यावरण कमी होऊ लागते. त्यात अर्थातच बरीच झाडे जगू शकत नाहीत. लोकांच्या गर्दीचा ताण आणि गिरीपुष्पाचा ससेमिरा यातून घोराडेश्वरच्या डोंगरावर वृक्षरोपणाने चांगले मुळ धरले आहे. पाच वर्षे वयाची झाडे बघून मोठा आनंद होतो. या भागात कातळात खोदलेली पाण्याची तीन पुरातन टाकी आहेत. काही भागात त्याचा वापर वृक्षारोपणासाठी होत आहे. 

आम्हाला प्रत्येक टप्प्यावर कार्यकर्ते वखर, खुरप चालवताना झाडांना पाणी देताना, त्यांच्या मुळाशी असलेले तणकट स्वच्छ करताना दृष्टीस पडत होते. एकएका जत्थ्याची भेट घेत आम्ही वरच्या भागात पोहोचलो. तिथून लेणींचा समुह असलेल्या उत्तरपूर्व भागात उतरलो. कातळात खोदलेल्या पुरातन पाणी टाकी पाहून जितका आनंद झाला तितकाच आनंद लेण्यांच्या दर्शनाने घडत होता. विनित दाते हा हाडाचा भटक्या आहे. अभ्यासूपणाने त्याने आपल्या भटकंतीचे वर्णन ब्लॉगच्या माध्यमातून करून ठेवले आहे. त्याच्या सोबत लेणी पाहण्याची मजा येत होती. साईप्रकाश बेलसरे, सागर बोरकर या प्रसिद्द ब्लॉगर्सचे घोराडेश्वर विषयी ब्लॉग वाचायला मिळाले. काही जणांनी व्ह्लॉग्ज म्हणजे ब्लॉग आणि व्हिडीयो यांचा मेळ साधून केलेले वार्तांकन यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत. माहितीच्या महाजालावरचा हा आजघडीचा लोकप्रिय प्रकार.

सगळ्याच लेणी बघण्याचा आज योग होता. इथे पाच शिलालेख आहेत ही माहिती ऐकून आनंद द्विगुणीत झाला. लेण्या साधारणपणे डोंगराच्या मधल्या भागात आहेत. त्याच्या वरचा भाग हा वहिवाटीचा नाही. काही ठिकाणी तो खुप निसरडा. काही ठिकाणे तर इतकी जोखिमेची की, कोणी घसरलं तर त्याचं काही खरं नाही. तरीही डोंगराची शिस्त ठाऊक नसलल्या लोकांची गर्दी पाहून धातीत धडकी भरते. काही वर्षांपूर्वी एक पर्यटक येथून पाय घसरून मृत्यूमुखी पडला होता. या घटनेनंतरही लोक निर्धास्तपणे चालताना पाहून मनात भिती निर्माण होत होती. 

या लेणी खोदण्याची सुरूवात ईसवीसनाच्या पहिल्या शतकापासून झाल्याच्या नोंदी अभ्यासकांनी करून ठेवल्या आहेत. काही लेणी या अवघड ठिकाणी आहेत. तिथे उभ्या कड्याचा कातळटप्पा पार करून जावे लागते. सर्वसाधारण पर्यटक या ठिकाणी जात नाहीत. हा भाग लोकांच्या नजरेपासून दूर आहे हे बरेच आहे.

काहीशा अवघड कातळारोहणानंतर लागणारा दोन विहारांचा पायरी मार्ग

अबब...भलं मोठं पोळं...उठलं तर पळताभूई थोडी

विनीत आम्हाला एका ठिकाणी घेऊन गेला. डोंगरकड्यात वीस एक पायर्‍या आहेत. काही ठिकाणी तुटक्या आहेत. डोंगराला चिकटून सावकाशपणे वर जावे लागते. वर दोन विहार आहेत. यांची निर्मीती बौद्द साधकांसाठी केली गेली असावी. आम्ही वर गेलो तर एका विहारात दोन एक फुटाचे भले मोठे मधमाशांचे पोळे लोगलेले होते. त्यातून मधमाशांच्या पंखांचे आवाज भितीदायक वाटत होते. तिथे थांबण्याची जोखिम न पत्कारता आम्ही तात्काळ ते ठिकाण सोडले. 'याठिकाणी लेणीत मधमाळीचे पोळे लागले आहे, पर्यटकांनी तिथे जाऊ नये, अन्यथा त्याचे घातक परिणाम होऊ शकतात', हा इशारा लोकांनी ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे. अशा अवघड ठिकाणी मधमाशांचे पोळे लागले तर ते नेहमी तिथे लागत राहणार. असेही हे ठिकाण पर्यटकांच्या नजरेपासून दूर आहे. त्याचा कडा व पायर्‍या या जोखिमेच्या आहेत. मधुमक्षिकांचं जग तिथे फुलणार असे तर ते तसचं फुलू द्यावं. नाही तरी माणूस म्हणून आपण वन्यजीवांचा अधिवास व भोजन यावर प्रचंड अतिक्रमण केले आहे. 


श्री घोराडेश्वराचे मुळ स्थान - याच्या वरच्या भागात 

हर्मिकेचा भाग साबूत आहे...सुरूवातीच्या काळात येथे स्तूप असावा...

काहीशा पश्चिमी बाजूला घोराडेश्वराचे जुनेस्थान आहे. या ठिकाणी काही कोरीव स्तंभ हिनयान काळातील बांधकामाकडे निर्देश करतात. अर्थात हे देखिल मुळ शिवस्थान नाही हे हरमिकेचे अवशेष पाहून लक्षात येते. या लेणीच्या बाहेर नंदी ठेवला आहे तोही स्तूपाचा भाग असावा. मंदिराच्या भिंतीवरचा इ.स. १४३९ म्हणजे १५व्या शकतात या लेण्यांचे रूपांतर करण्यात आले त्या संबंधीचा आहे. त्यातले धनकाटक हे नाव सद्याचे डहाणू या शहराशी संबंधित असावे असा अभ्यासकांचा कयास आहे. या मंदिराला अलिकडच्या काळात लोखंडी दरवाजा बसविण्यात आला. त्यात एक शिलालेख क्षतिग्रस्त झाला आहे. या ठिकाणहून उतरून आल्यावर खालाच्या बाजुला नविन घोराडेश्वराचे लिंग स्थापित करण्यात आले आहे. ही सर्वात प्रशस्थ लेणी असून येथे शिवभक्तांची नेहमी वर्दळ असते. महाशिवरात्रीला येथे मोठे जत्रा भरते. तेव्हा गर्दी नियंत्रीत करण्यासाठी येथे लोखंडी नळकांड्यांचे दुभाजक बसविले आहे. बाहेरच्या बाजुला काही ठिकाणी अशा नळकांड्यांचे रेलिंग किंवा संरक्षक कडे तयार करण्यात आले आहे जे इथल्या गौरवशाली पुरातत्वीय बांधकामाशी अजिबात मेळ खात नाहीत. इतके अफाट बांधकाम आपण आजच्या काळात करू शकत नाही तर जे आहे त्यांचे जतन चांगल्या पद्धतीने करावे. एक पुरातत्व विभागाच्या नियमांचे कसोशिने पालन केले तरी अशा स्वरूपाचे ओंगळवाणे काम करण्याची कोणाची छाती होणार नाही. अशा कामांना परवानगी कशी काय दिली जाते हा एक प्रश्नच आहे. 

जाता जाता एक गोष्ट सांगाविशी वाटते. डोंगर कितीही लहान असला. वहिवाट गर्दीचा असला तरी तो सोपा असतो असे नाही. पुण्याला येताना माझ्याकडे भटकंतीसाठी नेहमी वापरतो तो गणवेश नव्हता व बुट नव्हते. बर्‍याच वर्षांपासून सह्याद्रीत भटकंतीचा अनूभव असल्याने जपूनच चालत होतो, तरी खाली उतरल्यानंतर एकेठिकाणी थोडी घसरगुंडी झालीच. पडतापडता हात पुढे करून सावरता आले, परंतू त्यात हात थोडा दुखावला. दुखापत मोठी नाही. अवघड ठिकाणी भरपूर काळजी घेतली होती. येथे येणार्‍यांनी ती जाणिव पूर्वक घ्यावी. 

।।जय हो।।

तुमची घोराडेश्वर शेलारवाडीची यात्री सुखकारक, निर्धोक, झाडांचे रक्षण करणारी, लेण्यांचे संवर्धन करणारी ठरो...या शुभेच्छा



रूजणे अमचा धर्म...तुमचा धर्म रखरखावाचा का नाही?
याला आता एकही पान नाही...उन्ह वाढतील तसा हा लाला लालभडक लूसलूशीत फुलांनी डवरून जाईल...


ही फुले कदाचित फक्त पक्षांसाठी राखलेली असावी...कोणी झाडावर चढून तोडू नये यासाठी कदाचित याला अशा दणकट काण्यांचे संरक्षण तर नसेल ना?


निळ्या आकाशी पडद्यावर चाफा...काटेसावराचा बहर


घोराडेश्वराची सद्याच सर्वाधिक वापरात असलेली लेणी -

अनूपम प्राचीन वारशाला यापेक्षा चांगले रूप देता येऊ शकत नाही का?



कमी वर्दळ असलेल्या वरच्या लेणीतील श्री घोराडेश्वराचे मुळ स्थान -

याच्या वरच्या भागात हर्मिकेचा भाग साबूत आहे...

सुरूवातीच्या काळात येथे स्तूप असावा...

अनूपम ऐतिहासिक वारसास्थळी अशा प्रकारचे पाईपकाम न केवळ कुचकामी...ते खुप ओंगळवाणेही दिसते...शिवाय तीन चार वर्षात त्याचा निकाल लागतो


http://prashantpardeshi.blogspot.com/2021/02/blog-post.html




No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...