Saturday, February 12, 2022

राजमाची

मुंबई-पुणे हा देशातील एक प्रचंद वर्दळीचा हमरस्ता ! पुण्याहून मुंबईला जाताना लोणावळा हा एक मस्ट स्टॉप.इथल्या चिक्कीचा आस्वाद घेउन आणि चहा,नाष्टा करुन खंडाळा ओलांडून आपण प्रवेश करतो बोरघाट उर्फ खंडाळ्याच्या घाटात. सुरवातीला जी उजव्या हाताला दरी दिसते तिथे लांब उत्तरेला दिसणारे दोन सुळके माथ्यावर घेउन आडवा पसरलेला डोंगर आणि मध्ये असणारी दरी चटकन लक्ष वेधून घेते.इतिहासप्रेमी आणि दुर्गभटक्यांना याची ओळख असतेच.सर्वसामान्य पर्यट्कांना याचा परिचय नसला तरी राजमाची पोंईटवरुन त्यांनाही या प्राचीन दुर्गाची ओळख पटते.हा आहे दोन बालेकिल्ले असणारा एकमेव दुर्ग राजमाची !आज आपण याचीच ओळख करुन घेणार आहोत.सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा पासून निघणार्‍या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर ‘उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. याच ‘उल्हास नदीच्या खोर्‍याच्या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस १५ किमी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण - नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणार्‍या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाची.राजधानी वसविण्याएवढी विस्तीर्ण माची असलेला, तो राजमाची! सातवाहन काळापासून प्राचीन घाटमार्गावर असलेला हा किल्ला प्रचंड वनांनी आणि निसर्गरम्य हिरवाईने वेढलेला आहे. राजमाची किल्ल्याची समुद्रसपाटी पासूनची उंची सुमारे २७०० फुट आहे.

    किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ले, तर दुसर्‍या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. या गडाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे राजमाची हा एकच किल्ला असुन या किल्ल्याच्या माचीवर मनरंजन व श्रीवर्धन हे दोन बालेकिल्ले आहेत. दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय. या किल्ल्याचा पसारा प्रचंड असुन अवशेष देखील मोठया प्रमाणात आहेत. निसर्गसुंदर अशा या किल्ल्याला भेट दिल्यावर आपल्या भटकंतीला पुर्ण न्याय मिळावा यासाठी या एका दुर्गाचे तीन भागात विभाजन केलेले आहे. पहिला भाग म्हणजे माचीचा भाग जो राजमाची म्हणुन संबोधला आहे. दुसरा भाग म्हणजे श्रीवर्धन बालेकिल्ला आणि तिसरा भाग म्हणजे मनरंजन. या तिघांपैकी राजमाची या माचीची ओळख आपण येथे करून घेणार आहोत. 

      राजमाचीचे मोठे कलात्मक वर्णन देखील करता येते. त्याने सातवाहन पाहिले... शक पाहिले... वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार, यादव, सुलतान, बहामनी, मुघल, निजामशाही, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई, इंग्रज... अशा नंतरच्या सगळ्याच सत्तांतरांचा तो साक्षीदार आहे. काही स्वकीयांमधील होती... तर काही परकीयांमार्फतही झाली... पण तो डगमगलेला नाही. त्याने कोंडाणे लेण्यांतील सृजन अनुभवले... आणि मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धातील संहारही अनुभवला! त्याने अत्यंत शांतपणे होणारा बैला-गाढवांवरील लहानमोठा व्यापार अनुभवला... आणि कधी मंजूळ, तर कधी कर्णकटू आवाज करत सरकणा-या रेल्वेगाड्यांनाही अनुभवतो आहे! समोरच्या कातळधारेवरून सिंचन करणा-या जलधारा तो अनुभवतोच... पण पुढे कोकणातून जाणा-या अवखळ उल्हासचेही तो कौतुक करतो!सह्याद्री पर्वताच्या एका अतिशय लोभस वळणावर असलेल्या नाक्यावर तो उभा आहे. त्याच्याच साक्षीने उत्तर कोकणाला आकाशीचे अमृत पुरविणारी उल्हास नदी खळाळत वाहते. त्याला खंबीर साथ मिळते ती ढाक आणि मांजरसुंभा या मानक-यांची! लोहगड, तुंग, मोरगिरी, नागफणी, कर्नाळा, ईर्शाळगड, माथेरान अशा एकापेक्षा एक सरस मानक-यांनी तो वेढला गेलेला आहे. त्याचे सौंदर्य जरी पावसाळ्यात खुलत असले... तरी बाराही महिन्यात आणि सहाही ऋतूंमध्ये तो लोभस दिसतो... घरातल्या वत्सल आजोबासारखा! त्याच्या माथ्यांची नांवेही किती समर्पक आहेत? श्रीवर्धन... श्री म्हणजेच संपत्तीची वृद्धी करणारा... अर्थात कर्तुत्ववान! मनरंजन... आपल्या आश्रितांची करमणूक करणारा... अर्थात लेकुरवाळा!! ख-या अर्थाने तो 'पितामह' आहे!!

       आता काळाच्या बदलत्या प्रवाहात राजमाची देखील बदलाचे चक्र अनुभवतो आहे. रायगड आणि पुणे जिल्हय़ांच्या सीमेवरून गेलेली सहय़ाद्रीची रांग ही नेहमीच सर्व प्रकारच्या भटक्यांना आकर्षित करत आली आहे. या रांगेदरम्यान कितीतरी निसर्गरम्य आणि डोळयांची पारणं फेडणारी ठिकाणं लपली आहेत. लोणावळा, खंडाळा ही ‘हॉट डेस्टिनेशन’ तर आहेतच, याशिवाय भाजे, कार्ला, बेडसे अशा एकापेक्षा एक सरस लेण्यादेखील यात सामावलेल्या आहेत.
       दुर्गप्रेमींसाठी तर ही रांग म्हणजे एक प्रकारची भटकंतीची मेजवानीच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर, घनगड, ढाकचा बहिरी, कळकरायचा सुळका, नागफणी, तेलबैला अशी एकापेक्षा एक सरस नावं या दरम्यान आढळतील. या नावांतच आणखी एक भर पडली आहे ती ‘राजमाची’ या किल्ल्याची! नावाप्रमाणेच या किल्ल्याचं रूपही राजस आहे. त्यामुळे हे राजबिंड रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आज असंख्य दुर्गभटके तिथली वाट चालू लागतात .
     तसं पाहिलं तर हा राजमाची अगदी शब्दश: दोन जिल्हय़ांच्या सीमेवरच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे असा ट्रेनने नेहमी प्रवास करणा-या प्रवाशांना याचं कधीतरी दर्शन झालेलंही असतं. खंडाळा बोगद्याच्या अलीकडे डावीकडे पाहिल्यास तटबंदीचा शेलापागोटे बांधलेला हा किल्ला ओळखणं अवघड नाही. नेमकी हीच गोष्ट अस्सल भटक्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नाही. अत्यंत दुर्गम जागा अन् अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत शेकडो मैल दूर असणा-या उधेवाडीत हा किल्ला वसलेला आहे. उधेवाडी हे गाव आहे पुणे जिल्हय़ातील मावळच्या पश्चिमेला. म्हणजेच लोणावळ्यापासून बारा-तेरा किलोमीटरवर. त्यामुळेच लगतच्या शहरी भागाकडून बरेच पर्यटक या किल्ल्यांवर वीकएंडचा मुहूर्त गाठून येत असतात.
या प्राचीन गडाच्या इतिहासात डोकावल्यास याने अनेक विवीध प्रसंग अनुभवले आहेत आणि कालाचा एक मोठा पट उलगडताना राजमाची साक्षीदार आहे हे लक्षात येते.या किल्ल्याने सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूल, यादव, कदंब, बहमनी, आदिलशाही, शिवशाही, पेशवाई या सा-या राजवटी पाहिल्या असून किल्ल्याच्या जडणघडणीत या सा-यांचे हात लागले असल्याचे गडावर पहायला मिळते. या किल्ल्याला फार ज्वलंत नसला, तरी प्रदीर्घ असा इतिहास आहे. गडाच्या पोटात ठिकठिकाणी खोदलेली शैलगृहे, पाण्याच्या टाक्या आणि मुख्य म्हणजे या गडाशेजारीच असलेली कोंडाणे लेणी या साऱ्या खाणाखुणा या गडाला प्राचीन काळापर्यंत घेऊन जातात. या गडाजवळून वाहणारा बोर घाट हा प्राचीन काळापासूनच वाहता आहे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठीच या गडाची निर्मिती झाली. हे निश्चित! हा काळ बहुधा सातवाहनांचा म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा! यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, मुस्लिम सत्ताही या गडावर नांदून गेल्या.
    राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे यालाच ‘कोंडाणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस २ किमी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसया शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणार्‍या सत्तेखाली झाली. यावरुनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण २५०० वर्षापूर्वीचा असावा. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणचा दरवाजा’संबोधण्यात येत असे.
    कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. 
 एतिहासिक कागदपत्रे वाचताना खुप काळजी घ्यावी लागते, कारण जसा मराठीमधे श्लेष अलंकार आहे, ज्यामधे एकाच वाक्याचे दोन अर्थ निघतात, तसेच मोडी लिपीच्या लिहीण्याच्या सलगतेमुळे कदाचित चुकीचा निष्कर्श निघू शकतो. नेमकी अशीच एक घटना वर्धनगड किल्ल्याबाबत झाली असावी.
     जेधे शकावली या शिवचरित्राच्या दृष्टीने महत्वाच्या आणि अस्सल साधनामधे एक उल्लेख आहे, "राजश्रीवर्धनगडास जाउन संपुर्ण उष्माकाल राहिले". १२ आक्टोंबर ते नोव्हेंबर १६६१ असे महिनाभर शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. पण नेमक्या कोणत्या गडावर असा प्रश्न महत्वाचा आहे. आता पर्यंत सर्वच ग्रंथात 'राजश्रीवर्धनगडास' या वाक्यावरुन राजश्री म्हणजे शिवाजी महाराज सातारा जिल्ह्यातील वर्धनगडावर येउन राहिले अशी माहिती देण्यात आली आहे. पण हि माहिती चुकीची आहे, कारण त्यांचा मुक्काम या वेळी सातारा जिल्ह्यातील वर्धनगडावर नसून पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील राजमाचीच्या बालेकिल्ल्यावर म्हणजे श्रीवर्धनगडावर होता. याचे कारण असे कि याच दरम्यान म्हणजे जाने-फेब्रुवारी १६६१ मधे कारतलबखानाचा उंबरखिंडीत पराभव करुन महाराज दक्षिण कोकणात उतरले. शृंगारपुरच्या शिर्के व पालवणच्या जसवंत दळवी या आदिलशाही सरदाराचां पराभव करुन चिरदुर्ग हा बेवसाउ गड ताब्यात घेतला, व त्याची पुनर्बांधणी करुन त्याला मंडणगड नाव दिले. अर्थात याच काळात शाहिस्तेमामा पुण्यात लालमहालात तळ ठोकून होते. डिवचलेला हा खान पुढील कोणत्या चाली करतो त्यावरही नजर ठेवणे आवश्यक होते. याच काळात पेण परिसरात महाराजांच्या सैन्याच्या हालचाली चालू होत्या. स्वतः महाराजांनी पेणजवळच्या मिर्‍या डोंगराजवळ नामदारखानाचा पराभव केला. या सर्व घटना या कथित विश्रंतीच्या आसपासच झालेल्या आहेत. याचा अर्थ शाहिस्तेखानाचे सरदार लोणावळा खोपोली परिसरात आक्रमणे करीत असताना शिवाजी महाराज या प्रदेशापासून लांब सातार्‍या जिल्ह्यात वर्धनगडावर मुक्काम करतील हि शक्यता नाही. एकतर हा परिसर त्यावेळी स्वराज्यात नव्हता, शिवाय फलटणचे निंबाळकर, म्हसवडचे माने असे स्वराज्याचे शत्रु या भागात असताना मुळात १६६१ मधे वर्धनगड अस्तित्वात होता याचा पुरावा नाही. यापुर्वी या परिसरातील गडांची माहिती देतानाच लिहीले आहे कि मिर्झाराजे जयसिंहाबरोबरच्या तहानंतर शिवाजी महाराज व मिर्झाराजे यांच्या संयुक्त फौजांनी आदिलशाही मुलुखावर आक्रमण केले. त्या स्वारीत फक्त संतोषगड उर्फ ताथवडा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. या परिसरातील दुसर्‍या कोणत्याही गडाचे नाव येत नाही. शिवाय या मोहीमेतील प्रत्येक घटना मिर्झाराजे पत्राद्वारे औरंगजेबाला कळवत होते, त्यामधेही वर्धनगडाचा उल्लेख यायला पाहिजे होता. अफझलखानाच्या वधानंतर जरी हा परिसर महाराजांनी ताब्यात घेतला असला तरी सिध्दी जोहरच्या वेढ्यातून पन्हाळ्यावरुन सुटका झाल्यानंतर आदिलशहाशी जो तह केला त्यात हा परिसर त्यांना आदिलशहाला द्यावा लागला. त्या काळात महाराज या परिसरात कोणताही नवा गड उभारणे शक्यच नव्ह्ते. याचा अर्थ वर्धनगडाची उभारणी महाराजांनी १६७१ ते ७३ दरम्यान केली असावी. ( सातारा जिल्हा गॅझेटियरप्रमाणे १६७३ ते १६७४ दरम्यान )
आता रहाता राहिला मुद्दा नावाचा, " श्रीवर्धनगड". जेधे शकावलीच्या उल्लेखाप्रमाणे "राजश्रीवर्धनगडास आले", असा उल्लेख आहे. संशोधकांनी त्याची फोड राजश्री वर्धनगडास आले, अशी केली, कारण बहुतेक संशोधकांना वर्धनगड माहिती होता, पण राजमाचीचे बालेकिल्ले स्वतंत्रपणे श्रीवर्धन व मनरंजन असे ओळखले जातात आणि स्वतंत्र किल्ले म्हणून गणले जातात हि बाब त्यांनी लक्षात घेतली नाही. ( विशेष म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ रेवस इथे मनरंजन व मांडवा इथे श्रीवर्धन अश्या दोन गढ्या शिवाजी महाराजांनी बांधल्याचा उल्लेख आहे, पुढे त्या मानाजी आंग्रांनी पाडून टाकल्या ) संभाजी महाराजांचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी बाजी सर्जेराव जेधे यांना लिहीलेल्या ३ मार्च १६८६ रोजीच्या पत्रात लिहीतात कि, "कबिला ( कुटुंब ) रोहिडागडी ठेउन तुम्ही आम्हापासी श्रीवर्धनगडी भेटीस येणे", मात्र सातार्‍या जिल्ह्यातील वर्धनगडाचा उल्लेख हा वर्धनगड म्हणूनच येतो.
शिवाय मोडी लिपीत लिहीताना राजश्री श्रीवर्धनगडास आले, असे दोनदा श्री न लिहीता राजश्रीवर्धनगडास असे लिहीणे हे सामान्य बाब आहे, अशी उदाहरणे अन्यत्र आहेत. जेधे शकावलीतही अशी उदाहरणे आहेत.
   पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यावर इ.स. १७०४ मध्ये राजमाची किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी राजमाचीवर पुन्हा भगवा फडकवला. यानंतर १७१३मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला.
 सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवरावांच्या तोतया संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला. या ठिकाणी मराठा सैन्याने त्याला अडवायचा प्रयत्न केला.मात्र त्याला न जुमानता त्याने बोरघाट ताब्यात घेतला.राजमाचीच्या किल्लेदारामे काहीही तक्रार न करता किल्ला त्याच्या ताब्यात दिला.यामुळे पेशव्यांच्या दरबारात मोठा गोंधळ निर्माण झाला.नाना फडणवीस यांनी तोतयाशी तहाचे बोलणे सुरु केले.यामुळे मात्र तोतया बेसावध तर झालाच, पण आता आपलेच राज्य या घमेंडीतून त्याच्या सैन्याची शिस्त मोडली.तो बेसावध असताना पेशव्यांच्या दोन सरदारांनी त्याच्यावर हल्ला करुन त्याचा पराभव केला.त्यावेळी हा तोतया म्हणजे सदोबा नावाचा कनोजी ब्राम्हण मुंबईला पळून गेला.पण आंग्रेनी त्याला पकडून पुण्याला पाठवून दिले आणि पुढे या तोतयाला हत्तीच्या पायी दिले गेले.पेशवाईची समाप्ती होताच ब्रिटीशांचा वरवंटा पुर्ण सह्याद्रीत फिरला.यावचेळी १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.
    उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड ’म्हणतात या कुंडात लोक मोठ्या श्रध्देने स्नान करतात.

लोणावळ्यासारख्या प्रसिध्द आणि गर्दीने ओसंडून वहाणार्‍या पर्यटनस्थळाजवळ हा प्राचीन दुर्ग असला तरी इथे जाणे तुलनेने यातायातीचे आहे. सध्या तरी तीन वाटांनी या गडाकडे जाता येते.या तिन्ही वाटांची सविस्तर माहिती घेउया.
a
१) लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे:-
लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे उधेवाडी गावात यावे. ही वाट एकदंर १५ कि.मी ची आहे. या वाटेने किल्ल्यावर जाण्यास ५ तास लागतात. पुणे-मुंबई महामार्गाने लोणावळयाहुन खोपोलीला जाताना खंडाळ्याच्या घाटात घाट सुरु होताना राजमाची पॉईंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच राजमाची किल्ला. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती 'कातळदरा' या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला भैरोबाचा डोंगर म्हणतात. अनेकजण राजमाची या सोप्या ट्रेकपासून ट्रेकींगची सुरवात करतात्,लोणावळ्यापासून भरपुर चाल असल्यामुळे बहुतेकजण रात्री लोणावळ्याला उतरुन रात्रीच्या थंड वातावरणात पाच कि.मी.ची वाटचाल करुन पहाटे उधेवाडी गावत पोहचेल असे नियोजन करतात. यासाठी लोणावळा एसटी स्टॅण्डच्या पुढे आल्यावर जुना मुंबई-पुणे महामार्ग लागतो.पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्लीला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात.  भारत पेट्रोलियमचा पंप हा तिथला लॅण्डमार्क. त्या पंपाच्या इथूनच वाट तुंगार्लीला जाते. तुंगार्ली गाव संपता संपता द्रुतगती महामार्गाच्या खालून तो रस्ता जातो तो समोरच्या एका पहाडावर. त्याच्या पायथ्याची बंगल्यांची रांगच आहे. त्या पहाडाचा तीव्र चढ चढला की तुंगार्ली धरण आलंच.
 तुंगार्ली धरणाची भिंत त्या अंधारात डरावणी वाटते. डाव्या बाजूला दाट झाडी आणि त्यातूनच खालच्या दरीत लोणावळ्यातल्या दिव्यांचा प्रकाश झिरपत असतो. रात्रीच्या अंधारात चमकणारं काळंशार पाणी मोठं गूढ वातावरण निर्माण करत असते. मात्र धरणाच्या भिंतीवर जायचे तर मुख्य रस्ता सोडून उजवीकडचा एक लहानसा चढ चढून भिंतीवर यावे लागते. धरणाच्या ४/५ फर्लांगावर पांगळोलीची ठाकरवाडी. रात्री इथून जातांना खूप भिती वाटे ती इथल्या कुत्र्यांची. दिवसा शामळू भासणारी कुत्री रात्री विलक्षण शूर होतात आणि सर्व बाजूंनी गलका करुन अंगावर येऊ बघतात. इथून जाताना हाती काठी असणे अगदी जरुरीचे असे. पांगळोलीची आदिवासी वाडी अगदी लहानशी आहे, ती संपल्यासंपल्याच तिथूनच ती सुप्रसिद्ध घळ सुरु होई. घळीच्या सुरुवातीलाच ते राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन दिसतात. तीव्र उताराची ती झाडीभरली घळ उतरणे एकदम मौजेचे आहे. मधूनच एखादा वन्यप्राणी बाजूंच्या झुडपांतून खसफसत जाई. ती घळ संपल्यावर मात्र एकाएकी सपाटीची वाट येई.
        पांगळोलीच्याच डाव्या बाजूच्या डोंगरावर एक टॉवर होता, आजही आहे. त्यावर लाल दिवा चमकत असे. हा टॉवर बहुधा विमानांसाठी दिशादर्शक असावा. हा टॉवर लोणावळ्याच्या परिसरात कुठूनही दिसतो. अगदी भाजे लेणीवरुन, लोहगड, विसापूर किल्ल्यांवरुन, ड्युक्स नोज वरुन, वाघदरीच्या इथून, कुठूनही. आणि जेव्हा जेव्हा तो टॉवर बघतो तेव्हा तेव्हा राजमाचीच्या आठवणी दाटूत येतातच. तो टॉवर आणि भारत पेट्रोलियमचा पंप पाहिल्यावर कट्टर भटक्यांना राजमाचीचीच आठवण होईल ह्याला कुणाचेही दुमत नसावे.

राजमाचीला जाताना वाट चुकायची शक्यता अत्यंत नगण्य. तुम्ही एकदा त्या द्रुतगती महामार्गाच्या खालून जाऊन तुंगार्ली धरण्याच्या वाटेला लागलात तर एकतर राजमाचीला पोहोचाल नाहीतर थेट ढाकच्या बहिरीला भिडाल.
 घळीत जरी असंख्य फाटे असले तरी मुख्य पायवाट सोडायची नाही, ती थेट खालच्या सपाटीलाच आणून सोडते. सपाटीला लागते ती कुणे गावारुन येणारी वाट. ही वाट म्हणजे माचीला जाणारी गाडीवाट. डावीकडे पाचेक किलोमीटरवर कुणे गाव तर सरळ जाणारी वाट राजमाचीला जाई. लगेचच डाव्या बाजूला सह्याद्रीची खोल दरी दिसते तर उजव्या बाजूला खड्या कातळाची लांबच लांब भिंत. त्या वाटेच्या सुरुवातीलाच एक कठडा होता. इथून पुढे बरीचशी वाटचाल सपाटीवरुनच होई. डाव्या बाजूची दरी अधिकच खोल खोल होत विस्तारत जाते तर उजवीकडची कातळभिंती दूर दूर जात असे.
 
 मधूनच दरीपल्याडच्या डोंगरातून रेल्वे जाताना दिसते. रात्रीच्या गडद अंधारात ते दृश्य मोठे विलक्षण वाटते. काही वेळा रेल्वे बोगद्यांतून प्रवास करत असता तिचे इंजिन व सुरुवातीचे काही डबे दृश्यमान असत, मधला भाग बोगद्यामुळे झाकोळून जातो तर मागचे काही डबे उठून दिसत. अशा वेळी एकामागोमाग दोन रेल्वे जात असल्याचा भास होतो. मधूनच त्या डोंगरावरल्या काळोख्या आभाळात एखादं विमान लुकलुकत जाताना दिसते. त्या सर्व अंधार्‍या पार्श्वभूमीवर समोरच दिसणारे, अगदी जवळ भासणारे ते दोन्ही बालेकिल्ले अगदी मनोरम भासतात.
त्या वाटेवरुनच पुढे गेल्यावर उजव्या बाजूस झाडीत एक अगदी लहानशी आदिवासी वस्ती आहे, ती म्हणजे फणसराई. तशी ती एकदम आतल्या बाजूला झाडीत, त्यामुळे तिकडे जायचे कारण नाही. इथूनच पावसाळ्यात डोंगरावरुन येणारे पाणी कातळधार धबधब्याला मिळते.
 ह्या धबधब्यापाशी जाणे मोठे कठीण, जाऊही नये. मात्र ह्याचे अतिशय सुंदर दृश्य राजमाची किल्ल्यावरुन दिसते. राजमाचीच्या ह्या नितांतसुंदर रस्त्याने चालत जात असताना दूरवर भेकरांचे भुंकणे तर रातव्यांची किचकिच कायम सोबतीला असे. ह्या कातळधारच्या पुढे आतापर्यंत समोरील बाजूस दिसणारे बालेकिल्ले आता अगदी डाव्या बाजूला शेजारीच आलेले दिसत.
 पुढे एक फाटा येतो. राजमाचीला जाताना हा फाटा चुकवून चालणारच नाही, सरळ रस्ता वळवंडच्या वाडीला जाऊ पुढे ढाकला जातो तर डावीकडचा रस्ता हा माचीला जातो. उजवीकडचा रस्ता जातो तो ढाकला. लोणावळा ढाक हे बरेच लांब अंतर आहे, जवळपास तीस-पस्तीस किमी. मध्ये वळवंडला शाळेत मुक्काम करुन परत पुढे ढाकची १२/१३ किमीची वाटचाल. हल्ली बहुतांश जण ढाकला जांभिवली कोंडेश्वर मार्गे जातात पण ज्यांना सह्याद्रीचे अस्सल रूप आणि असंख्य विभ्रम पाहायचे असतील ह्या लोणावळा-तुंगार्ली-फणसराई-वळवंड मार्गाशिवाय पर्याय नाही. आता हे शेजारी दिसणारे बालेकिल्ले चक्क आपल्या पाठीमागे दिसू लागत. त्यांच्या दरम्यान खोल दरी असल्याने तसेच पुढे चालत राहूनच दरीच्या वरच्या बाजूने जाऊन वळसा मारुनच माचीला पोहोचता येते.
२ ) कुणे गावमार्गे ( डेला ॲडव्हेंचरवरमार्गे ) :-
   हा अलिकडेच झालेला रस्ता.हा गाड्या जाव्यात यासाठी केलेला कच्चा रस्ता. खंडाळ्याला उजवं वळण घेउन हा रस्ता एका उतारावरून लगेचच 'यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गा'खालील भुयारी मार्गात शिरतो. लोणावळा-खंडाळा परिसरात असलेल्या कुणे गांवातून हा रस्ता जातो. या गांवामध्ये आता पर्यटनव्यवसायाच्या निमित्ताने नागरीकरणाने वेग पकडलेला दिसतो. पर्यायाने बांधकाम क्षेत्रातील वाहनांची वर्दळ चांगलीच दिसते.अनेक लहानथोर हॉटेल, रिसॉर्टस्, रेस्टॉरंटस् आणि आजकालचे चलनी नाणे असलेले ॲम्युझमेंट पार्कस् यांच्या बांधकामांची रेलचेल दिसते. रस्ता अर्थातच खराब आहे, पण पर्याय नाही.
    'डेला' अ‍ॅडव्हेंचर पार करुन हा रस्ता अप्परडेक रिसॉर्टजवळच्या एका छोट्या बंधा-याजवळ डावं वळण घेतलं कि आपण डुक्करमाळावर येतो. आता समोर राजमाची चांगला दिसू लागतो. वाटेवर लक्षणीय झाडी आहे. डावीकडे दरीची खोलीही जाणवत रहाते कातळधारेचा कडा ओलांडून पुढे वेळवंडच्या शिरवटा तलावाकडे जाणारा फाटा उजवीकडे ठेवून आपण उधेवाडीकडे वळतो. आता राजमाची डावीकडे अधिक स्पष्ट दिसत असतो तर समोर मांजरसुंभा आणि त्यामागे ढाक उंचावून पाहत असतो.थोड्याच वेळात आपण उधेवाडीच्या दरीपूलावर येतो.
 
    इथे आपल्याला एक भुशास्त्रीय वैशिष्ट्य अनुभवता येते. सह्याद्रीचा मुख्य कडा आणि राजमाचीचे पठार यांच्यामधील ही दरी म्हणजे एक भंगरेषा आहे. भूगर्भशास्त्रामध्ये याला lineament म्हणतात. ढाकपलिकडच्या सह्यकड्यावरील ठाकूरवाडीच्या जलाशयापासून ती सुरू होते. ढाक-सह्याद्रीदरम्यानची दरी मांजरसुंभा- उधेवाडी पूल- उल्हासची दरी - कुणे धबधबा - मंकीहिल - अमृतांजन पूल- नागफणीसमोरची दरी- उंबरखिंड  अशी ही भंगरेषा पसरलेली आहे. उपग्रह प्रतिमा किंवा गुगल प्रतिमा पाहिल्यास या रेषेचा स्पष्ट अंदाज येतो. 
या भंगरेषा म्हणजे भूपृष्ठाला गेलेले तडे असतात.तेथील भूपृष्ठ नाजूक असते. याचाच परिणाम म्हणून खोल द-या तयार होतात किंवा डोंगररांगा तयार होतात. अनेकदा अशा भंगरेषांवरील दरीतून पाणी वाहू लागते आणि उताराच्या तीव्रतेमुळे मोठ्या प्रमाणावर खडकांची झीज होऊन दरीचे रुपांतर घळईमध्ये होते. यांमुळेच उल्हास नदीची खोल घळई तयार झालेली आहे. अन्यथा, उल्हास ही इंद्रायणी नदीला मिळणा-या अनेक ओढ्यांपैकी एक ठरली असती. कड्याच्या रचनेमुळे आणि उतारामुळे ती अरबी समुद्राकडे वाहत जाते. पण, अन्य कोकणगंगांप्रमाणे सरळ पश्चिमेची वाट न पकडता, आधी उत्तरेकडे वाहते आणि नंतर पश्चिमेला वळते. त्यातही आणखी गंमतीचा विषय म्हणजे पुढे मुंबई बेटाच्या रचनेमुळे उल्हास नदीने ठाणे आणि वसई अशा दोन खाड्या तयार केल्या आहेत. भूगोलाच्या गंमतीजंमती आहेत या सगळ्या.लक्षात आल्या की मजा तर येतेच.पण हरखून जायला होतं!!
 ३) कर्जत मार्गे :-
     कोकणातून राजमाचीला थेट चढणारी हि वाट.एका दिवसात राजमाची बघायचा असेल तर सोयीची.मात्र खुप कमी ट्रेकर या वाटेने चढतात.याचे कारण कोकणाच्या दमट हवेमुळे या वाटेने चढणे तुलनेने दमवणारे आहे. त्यापेक्षा या वाटेने उतरुन कोंढाणे लेणे पाहून कर्जत स्टेशन गाठून घरी परत जाणे सोयीचे आहे.विशेषतः मुंबईकरांसाठी हि वाट सोयीची आहे. या वाटेने जायचे असेल तर दोन पर्याय आहेत.

  ठाकुरवाडीच्या मार्गाने दिसणारा राजमाची व त्याचे मनरंजन शिखर

   १) ठाकुरवाडी मार्गे :-
लोणावळा-कर्जत दरम्यान असलेल्या रेल्वेच्या खंडाळा घाटात ठाकुरवाडी हा छोटासा तांत्रिक कारणासाठी घेतलेला थांबा आहे.इथे स्टेशन वगैरे काही नाही.मात्र बहुतेक रेल्वे इथे थांबतात.रेल्वे थांबली कि पटकन उतरायचे आणि दरीच्या बाजुला असलेल्या ठाकुरवाडीच्या दिशेन चालायला सुरवात करायची.इथून थेट पायथ्याच्या उल्ल्हास नदीच्या पात्रापर्यंत उतरायचे आणि नदी ओलांडून पलीकडच्या ठाकुरवाडीत जाउन तिथून घनदाट झाडीतील वाटेने राजमाची गाठायची.काही रेल्वे ठाकुरवाडीला न थांबता पलीकडच्या मार्गावर असलेल्या नागनाथ स्टेशनला थांबतात.इथून आपल्याला ठाकुरवाडीपर्यंत चालत यावे लागते.वाटेत इच्छा असल्यास गंभीरनाथ गुंफा बघायची आणि रिव्हर्सिंग स्टेशन बघून ठाकुरवाडी गाठता येते.
   या वाटेवर राजमाची गडाच्या माथ्यापर्यंत पाणी नाही हि मोठी अडचण आहे. राजमाचीच्या कोकणच्या बाजूने चार पाच थरांचा आहे. उतार, प्रत्येक थरावर काहीशी सपाटी, परत उतार सुरु अशी चढण आहे. कुठल्याही मार्गे आलो तरी अंगावर येणारी दीड-दोन हजार फुटांची सरळ चढण चढावी लागते.
राजमाचीकडे निघालो, की भवतालची हिरवाईच आपले मन जिंकून घेते. यातही लोणावळय़ाकडून आलेल्या वाटेवर तर जास्तच! साग, ऐन, आंबा, जांभूळ, बेहडा, सावर, बहावा, पळस, पांगारा, कुडा, कुंभा, उंबर.. वाघाटी, पळसवेल, करवंद-बांबूची जाळी आणि अशाच किती वृक्षवेली वनस्पती! या साऱ्या वनस्पतींनी हे जंगल घट्ट केले आहे. पुन्हा या झाडीत नानातऱ्हेचे पशुपक्षी, कीटक, फुलपाखरे; ओढय़ानाल्यासारख्या नाना परिसंस्था! या साऱ्यांमुळे राजमाचीच्या वाटेवर प्रवेश होताच हा निसर्गच पहिल्यांदा वेड लावून टाकतो. 
 
 

  २) कोंदीवटे मार्गे :-
       ज्यांना डोंगरदऱ्या खालीवर करण्याची हौस आणि सवय आहे, अशांसाठी आणखी काही आडवाटा आहेत. कर्जतहून सहाआसनी रिक्षाने कोंदिवडे किंवा कोंडाणे गाव जवळ करायचे. कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्यावर जाणारी पाउलवाट खडतर आहे. या वाटेने उधेवाडीत पोहोचण्यास सुमारे ३ तास लागतात. वाटेत कोंढाणे लेणीही बघता येतात.
यापैकी कुठल्याही मार्गे आलो तरी अंगावर येणारी दीड-दोन हजार फुटांची सरळ चढण चढावी लागते.या मार्गे चढण्यापेक्षा उतरणे जास्त सोयीचे आहे.
काही महत्वाच्या गोष्टी :-
१) किल्ला चढाईला अवघड नसला तरी चालण्या साठी खूप अंतर आहे म्हणजे १६ किलोमीटर.
२) ज्याला चालण्याची सवय नाही त्यांनी इथे येऊ नये कारण इथे दुसरा पर्यायच नाहीये.
३) उन्हाळ्यात पूर्ण रस्त्यात पाणी नसते.
४) राहण्याची व भोजनाची उत्तम सोय गावात होऊ शकते.
५) शक्यतो जुन ते जानेवारी पर्यंत आपण ह्या किल्ल्यावर भेट देऊ शकतो.
६) उन्हाळ्यात जाणार असाल तर रात्रीच जाणे करावे.
७ ) पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस असतो. काही ठिकाणी आपला पाय गुढग्या इतक्या चिखलात जाऊ शकतो.
८) योग्य वेळीस इथे आलात तर आपल्याला खूप प्रमाणात करवंद खाण्यास मिळतील.
 
 राजमाची गडाचा नकाशा
लोणावळ्याकडून जर आपण राजमाचीला आलो तर आपल्याला राजमाचीची वेस लागते. या वेशीच्या आत शिरताच डाव्या हाताला गणेश, मारुतीचे मंदिर आहे. पुढे काही अंतरावर सतीच्या शिळाही आहेत. गणपती आणि हनुमानाचे नवीन मंदिर बांधले आहे पण मंदिरातील दोन्ही मूर्ती या पुरातन आहेत. मंदिरापुढे लगेचच राजमाचीच्या प्रवेशद्वाराचे बुरुज आणि तटबंदी भग्न अवस्थेत आहे. 
a
श्रीवर्धनचा उत्ताल कडा
a
उधेवाडी
जणू गडाचे हे पहिले पहारेकरीच! ही वेस ओलांडली की राजमाचीची हद्द सुरू. गडाची ही माची. या माचीवर मधोमध ते दोन बेलाग बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन! यातील श्रीवर्धन आपल्यावर लक्ष ठेवून असतो.
 वेशीवरील बुरुज
3

62


5

6

वाट काही वेळातच पायथ्याच्या उढेवाडी गावात पोहोचते. दहा-वीस घरांची ही वाडी पण प्रत्येकाचे अंगण अगदी साफसूफ, शेणामातीने सारवलेले. त्यावर झावळय़ांचे मांडव घातलेले. 
उधेवाडी ही कोळी लोकांची २०-२२ घरांची वाडी आहे. वाडीलगतच मारुतीचे मंदिर आहे. तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वन आहे. या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहिर आहे. या विहिरीत पाणी टिकत नाही. खरोखरच देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी र्वष लोटली; पण या गावाने विकासाची गंगा काही पाहिली नाही. वीज, डांबरी सडक तर सोडाच; पण साधं पाणीही या गावाला मिळू शकलं नाही. गडाच्या कुशीत राहणा-या या गावाला इतिहासानं मात्र कमी पडू दिलं नाही. या गावाला किल्ल्याचं पाणी तर मिळतंच; पण चरीतार्थही राजमाचीच्या पर्यटनावरच चालतो. इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी मंडळी तिथे गेली की हमखास मुक्काम ठोकतात. ही वाडीही तितकीच आपुलकीने राहण्याची, जेवणाची अल्पदरात सोय करतं. तिथलं वातावरण आणि आदरातिथ्यं पाहून पहिल्या दुर्गसाहित्य संमेलनाचा मानही याच किल्ल्याला मिळाला.तसं गाव खूप सुधारलं आहे पण महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजूनही लोणावळ्यापर्यंत पायपीट किंवा सायकल वारीने गाठावं लागतं. राजमाचीच्या या कायापालटाला जबाबदार आहेत ते दस्तूरखूद्द गोनीदांचा सहवास लाभलेले श्री मुकुंद गोंधळेकर. त्यांची राजमाची ग्राम सहाय्यक समिती ईथे स्तुत्य असं काम करतेय. उधेवाडी गावात राहण्याची उत्तम सोय होते. भैरवनाथाच्या मंदिरातही आणि बालेकिल्ल्यावर जातांना लागणार्‍या गुहेतही रहाता येते. राजमाची रुलर एड एन्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम या संस्थेने बांधलेल्या खोल्यांमध्येही रहाण्याची व्यवस्था होते.उढेवाडीतल्याच एखाद्या घरी आपली पथारी लावायची आणि राजमाची हिंडायला बाहेर पडायचे.
 उढेवाडीला खेटूनच एक दाट राई आहे. या राईत एक बांधीव तलाव आणि त्याच्या काठावर मध्ययुगीन महादेवाचे मंदिर आहे.
गोधनेश्वर मंदिराकडे जाणारी वाट 

गोधनेश्वर मंदिराकडे जाणारी वाट दुतर्फा मोठाल्या वृक्षांच्या सावलीतून जाते.वाटेतच उदयसागर नावाचा तलाव मोठा लागतो. व त्यापासून थोड्या पुढेच प्राचीन गोधनेश्वर मंदिर. मंदिराबाहेर असलेल्या गोमुखातून अखंड जल वाहत असते.  या मंदिराच्या पाठीमागे डोंगरातून येणारा हा झरा गोमुखाद्वारे मंदिराच्या पुढय़ातील टाकीत पडतो आणि पुढे मुख्य तलावाला जाऊन मिळतो. 

56

57

a
गोधनेश्वराचा तलाव किंवा उदयसागर

वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला, वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे. रामराव नारायणराव देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी हा तलाव शके १७१२ मध्ये बांधला असा त्यांच्या नावाचा शिलालेख या तलावाच्या भिंतीत आहे. तलावाच्या शेजारी एक चुन्याचा घाना आहे.या तलावाला अलिकडेच कोणीतरी उदयसागर हे नाव दिले आहे.तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळयात दरीतून पडणार्‍या धबधब्यांचे सुंदर दृष्य दिसते. हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस या अल्हाददायक वातावरणामुळे मनात कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात ,
पलिकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी
उत्तुंग तरुंची उभी सभोती श्रेणी
एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही
तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी
 
raa.jpg 
राजमाची - बालेकिल्ले
 
 या तलावाच्या काठावर आले की त्याच्या त्या स्वच्छ नितळ अशा पाण्यात साऱ्या राजमाचीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. पाण्यातले त्याचे हे रूप पाहावे आणि मग प्रत्यक्ष दर्शनासाठी गडाकडे निघावे.


गोधनेश्वर मंदिर परिसर




मंदिराच्या आतील शिवलिंग व तांब्याचे नाग

गणपतीची मुर्ती
            
   
इतर मुर्ती
58

59
महादेव असले कि समोर नंदी हे वाहन हवेच.
60

पुढे असलेले कुंड




तर मंदिराच्या समोर एक दिपमाळ देखील आहे.तर मंदिराच्या खांबांची एकसंध रचना, महादेवाकडे तोंड करून विराजमान झालेले नंदी महाराज, कोपऱ्यात असलेली गणपती व देवीची सुंदर मूर्ती आणि गोधनेश्वर महादेवाची सुंदर पिंड हे बघून भारावून जायला होते. मंदिराच्या बाजूला एका ठिकाणी एक कासव व त्याच्या पाठीवर पाऊले कोरलेली समाधी आहे.असे सांगतात की काही वर्षापर्यन्त हे देउळ अर्धे मातीत गाडलेले होते. गावकर्‍यांच्या प्रयत्नाने आता ते सुस्थितीत आहे. समोरच एक कोरीव दगडी स्तंभ उभा केलेला आहे. इथुनच पुढे चालत थोड्या अंतरवर दरीच्या टोकाशी जाता जेते. दरीच्या टोकावरुन उल्हास नदीचे खोरे, मुम्बई-पुणे रेल्वे लाईन, डयुकस नोजचा सुळका, मागे पाहिले असता मनरंजन व श्रीवर्धन दोन्ही बालेकिल्ले यांचे स्पष्ट दर्शन होते.
    माचीवरील ठिकाण बघीतल्यानंतर आता आपण जाणार आहोत बालेकिल्ल्याकडे.उढेवाडी गावातून बालेकिल्ल्यांच्या वाटेला लागले कि खिंडीकडे जाणाऱ्या वाटेतच कडय़ात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, अर्धवट लेणी गुहा लागते.  अलीकडे गुहेत मुक्कामाची सोय करता येते,किंबहुना पावसात झालेल्या गर्दीत माचीवरला कुठलाच कोपरा शिल्लक नसतो त्यामुळे तेव्हा या छोटेखानी गुहेलाही भाव आलेला असतो.
8
  
 
 
 
 
7


11    
 त्यावर मध्ययुगीन बांधकाम केलेले आहे. गणपती आणि फुलांची शिल्प आहे तर हल्ली मनरंजन वरील पाणी पाईपद्वारे इथल्या गुहेत आणले आहे. गुहा पाहून MTDC ने बांधलेल्या पायऱ्यांवरून श्रीवर्धन आणि मनरंजनच्या मधील खिंडीत जाऊन पोहोचायचे.  या खिंडीत भैरवनाथाचे एक प्रशस्त मंदिर आहे. गडावरील मुक्कामासाठी वाडीशिवाय हाही एक पर्याय! मनरंजन आणि श्रीवर्धनाच्या बेचक्यात हे भैरवनाथाचे राऊळ आहे. ज्यांनी कुणी ते पाहिलं असेल त्यांना ती किती मनोरम जागा आहे ह्याची कल्पना असेलच. गच्च झाडीत असलेले हे मंदिर विलक्षण रम्य आहे.


12

13


 
 
 
 
a
 श्रीवर्धनच्या माथ्यावरुन दिसणारे भैरवनाथाचे राऊळ
मनरंजन आणि श्रीवर्धन किल्ल्यांच्यामध्ये सखल भागावर वसलेले हे भैरोबाचे मंदिर
 
भैरवनाथ मंदिर परिसरातील तोफ ...लांबी 4.9 फूट
 
 
 
 खिंडीतून श्रीवर्धनचे दर्शन
 
रावळात काही शिवकालीन मूर्ती असून दगडी ठाणवई आहे आणि बाहेर दगडी घोडा, वीरगळ, स्तंभ, काही तोफा आणि दिपमाळ आहेत. मंदिरात भैरव आणि जोगेश्वरीच्या मूर्ती! छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी वेगवेगळय़ा काळात त्या अर्पण केलेल्या. मंदिरासमोर गडावरील तोफा ठेवलेल्या आहेत.मंदिराबाहेर एक अखंड तर दुसरी फुटलेली तोफ आहे. याशिवाय दीपमाळ, भोवतीने काही कोरीव शिल्पंदेखील आहेत. यातील गजान्तलक्ष्मीचे शिल्प तर पाहण्यासारखे.
आधी आपण मनरंजनची सैर करुया.
    मनरंजन बालेकिल्ला श्रीवर्धन पेक्षा थोडा उंचीने कमी आहे. मनरंजनच्या वाटेवर सुरुवातीला घनदाट वृक्षराजीतून पदभ्रमण सुरु होते. 
16
इथे एका ठिकाणी डाव्या हाताला फाटा आहे.तिथून थोडे अंतर गेले कि एक कातळ कोरीव खांब टाके दिसते.
या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मागच्या बाजुला दिसणार्‍या श्रीवर्धनला पाहत मनरंजनच्या प्रवेशद्वारापाशी दाखल व्हायचे.
श्रीवर्धन बालेकिल्ला
मनरंजनकडे चढणारा मार्ग
a
मनरंजनाच्या पोटातील लेणी

मनरंजनवरुन दिसणारी उढेवाडी
 





 
 
 


18
 मनरंजनचे प्रवेशद्वार

पडझड होऊनही आजही प्रवेशद्वाराची कमान आणि आतील देवड्या चांगल्या स्थितीत आहेत.दरवाजा कमानदार बांधणीचा आहे.कमानीच्या मधोमध उमललेले कमळ आणि त्याखाली कमळाची कळी कोरलेली आहे. दरवाज्याच्या बिजाग-या, अडसराचे खड्डे, पाणी वाहून जाण्याची योजना, जंग्या-चर्या ही योजना सारंकाही अजूनही तग धरून आहे. तटाचे चिरे मात्र चांगलेच ढासळलेले आहेत. येथील देवड्याही दुमजली दिसतात. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे.
 मनरंजनचा बुरुज

 मनरंजन किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी आहे. प्रवेशद्वारा तुन वर गेल्यावर डाव्या हाताला आपण एका बुरुजावर पोहोचतो. 
26

येथुन वर गेल्यावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत.वाटेत खोदलेली पाण्याची टाकी पाहत.. कडेकडेने चालत किल्लेदाराच्या वाड्यापाशी पोहोचतो.



23


24


25

22
 वाडा प्रशस्त आहे. इतर वाड्यांप्रमाणे याची देखील दुरावस्था झाली आहे. 



मनरंजन गडावर आढळलेले वीरगळ आणि शिवलिंगाची पिंड

21

वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर गणेशपट्टी व चंद्र-सूर्य कोरलेले आहेत.या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरेख गणेशपट्टी, बाजूचे चंद्र, सूर्य या शुभचिन्हांमुळे गडावरील ही एखादी महत्त्वाची वास्तू वाटते. हे बहुदा एखादे धान्य कोठार असावे असे वाटते.
27
वाडा बघून लगेच समोर असलेल्या सदरेवर जायचे. ह्या वाडयावरुन पुढे जाताच थोडया खालच्या बाजुला डाव्या बाजूला आपणास आणखी दोन आकाराने मोठी पाण्याची टाकी पाहावयास मिळतात.
20

 ह्यापैर्की एका टाक्यात उतरण्यासाठी दगडी पाय-या अस्तीतत्वात आहेत तर दुस-या टाक्यातील पाणी वाहुन जाऊ नये म्हणुन चांगलं ३ फुट रुंदीचे दगडी बांधकाम पहावयास मिळते. तसेच एका टाकी शेजारी वीरगळ आणि शिवलिंग आहे.टाक्याचे पाणी तर फारच चविष्ट.

    
मनरंजनचे मागील प्रवेशद्वार

        मुख्य दरवाजाच्या अलीकडील वाटेने तटाच्या कडेने चालत निघालो कि आपण मागील दरवाजात पोहोचतो. मुख्य प्रवेशद्वाराप्रमाणे हा देखील भक्कम आहे. मात्र मार्गावर माती, दगड-धोंडे कोसळले आहेत. त्यामुळे सांभाळून वाकून जावे लागते. या दरवाजातून बाहेर पडल्यानंतर राजमाचीच्या मागील बाजूचे निबीड पसरलेले अरण्य, ढाक बहिरीचा परिसर दिसतो.  मनरंजनवरून पश्चिमेकडचा देखावा खूपच रमणीय दिसतो म्हणूनही या बालेकिल्ल्याला ‘मनरंजन’ म्हणतात, असेही सांगितले जाते. 
श्रीवर्धनच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या मनरंजनला स्वयंसिद्ध अशी रक्षणाची साधने नसल्याने त्याच्या सभोवार मजबूत तट घातला आहे. एकापाठोपाठ तीन दरवाजांतून मनरंजनमध्ये प्रवेश करावा लागतो. गडाच्या आत विस्तीर्ण पठार असून त्यामध्ये दोन मोठे तलाव, दारूगोळय़ाचे कोठार, किल्लेदाराच्या उद्ध्वस्त वाडय़ाचे अवशेष, सदर आदी वास्तू दिसतात. 

 श्रीवर्धन:-
खिंडीतून श्रीवर्धनच्या दिशेने निघालो. श्रीवर्धनकडे जाणारी वाट सुस्पष्ट आहे. खिंडीतून वीस मिनिटात आपण पहिल्या दरवाज्यात पोहोचतो. यातील श्रीवर्धन हा उंचीने थोडासा उंच!
 28
   सुरवातीला नव्याने बांधून काढलेल्या पायर्‍या आहेत.
29
यावर जाण्यासाठी खडकातच पायऱ्यांचा मार्ग खोदलेला आहे. वाट सोपी आहे. नागमोडी चढत जाणा-या वाटेवर काही ठिकाणी खोदलेल्या पाय-याही दिसतात. या वाटेने चढताना तटाची भव्यता नजरेला जाणवतेच!
 
30
त्यानंतर कातळकोरीव पायर्‍या लागतात.
 
 

 श्रीवर्धनगडाच्या पहारेकर्यांच्या देवड्या बाजूला खांबांचे अवशेष व त्यांचे जोडणी....inter locking system ....

 
 श्रीवर्धनगडावरील एकमजली वास्तू अवशेष


31



a
श्रीवर्धनचा प्रवेशमार्ग ! हा गोमुखी मार्ग अप्रतिम आहे.गो.नि.दांडेकर या परिसराचे वर्णन करताना म्हणतात 'एखाद्या एतिहासिक चित्रपटासाठी सेट तयार करायचे असतील तर त्यासाठी डिझाईन इथून तयार करुन न्यावे.'



एका भव्य अर्धवर्तुळाकार बुरूजाजवळून आपण दुर्गप्रवेश करतो.पण आंतमध्ये असलेल्या दरवाज्याची कमान ढासळलेली आहे.त्यामुळे काहीसे हिरमुसायला होते. गोमुखी पद्धतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजूंची देवडी थक्क करून सोडते. वळणावळणाच्या मार्गावरील प्रशस्त आकाराची, रेखीव खांबांवर उभी असलेली ही देवडी पूर्वी बहुमजली होती. पण आता तिचे छत पूर्ण कोसळले आहे.  देवड्यांमधील कोनाड्यांना नक्षीदार चौकटी आहेत... दगडी खांबमात्र कोसळलेले आहेत. खांबांतील एकमेकांत अडकणारे दगड पाहिले, की आपण थक्क होतो.किमान तिच्या उभ्या भिंतीआणि खांब ढासळण्या-पडण्यापूर्वी तरी वाचवायला हवेत. पण हे करायचे कोणी?
 
 

   श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्‍यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. या दरवाजातून गडावर सरकावे तो डाव्या हाताला खडकात खोदलेली काही टाकी दिसतात. या टाक्यांच्या कडेलाच एक लोहस्तंभ पडलेला आहे. अंदाजे ८ फूट लांबीच्या या लोहस्तंभाचे नेमके प्रयोजन मात्र कळत नाही. रायगडावर देखील असाच एक स्तंभ आहे. आमच्या गडांवरील या अशा वस्तूंचे योग्य जतन आणि संशोधन व्हायला हवे.
36

32
 
 
 गंजलेली तोफ

दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर थोड्याच अंतरावर पाण्याचे टाके लागते. पाणी पिण्यास अयोग्य. याच पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक गंजलेली तोफ आहे. ही तोफ पूर्वी याच टाक्यात पडली होती ती एका दुर्गप्रेमी समूहाने बाहेर काढली.
 33
या टाक्यांच्या कडेलाच एक लोहस्तंभ पडलेला आहे. अंदाजे ८ फूट लांबीच्या या लोहस्तंभाचे नेमके प्रयोजन मात्र कळत नाही. रायगडावर देखील असाच एक स्तंभ आहे. आमच्या गडांवरील या अशा वस्तूंचे योग्य जतन आणि संशोधन व्हायला हवे.
a
  याच टाक्यांच्या पुढे कड्यालगत दोन पाण्याची टाकी आहेत. पण प्रचंड घसारा आणि वाऱ्याच्या वेगामुळे लांबूनच त्यांचे दर्शन घेत पुढे निघायचे. या टाकीजवळून निघालेली ही वाट पुढे एका शैलगृहाजवळ थांबते.


 
 34
 
 35      

a
श्रीवर्धनावरील लेणी

या मूळच्या शैलगृहांची मध्ययुगात धान्याची कोठारे झाली. या शैलगृहाच्या दरवाजांवर गणेशपट्टी आणि कमळे कोरलेली आहेत. ही वाट पुढे श्रीवर्धनच्या शिखराकडे निघते. वाटेत आणखी काही उद्ध्वस्त घरांचे अवशेष, बुजलेल्या टाक्या, विष्णूचे एक छतविना छोटेसे मंदिर आणि गडाची सदर लागते. पुढची वाट विविध प्रकारच्या वनस्पतींमधून मार्ग काढत श्रीवर्धनच्या निशाण बुरुजाखाली जाते. 
 
निशाण बुरुजाच्या जाण्याच्या वाटेवर एक छोटे कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील पाणी तर अमृताहूनि गोड. कोणालाही दोन घोट जास्त प्यायला वाटावे असेच आहे. थंडगार पाण्याचा आस्वाद घेत पायऱ्यावरून राजमाचीच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो.
a
भैरवनाथाचे राउळ, पाठीमागे मनरंजन





या साऱ्यांतून मार्ग काढत आपण गडाच्या सर्वोच्च अशा ढालकाठीच्या वा टेहळणीच्या बुरुजावर येतो. या बुरुजावर आता नव्याने ध्वजस्तंभ उभारला आहे. या बुरुजावरून सारा राजमाची किल्ला आणि परिसर नजरेत येतो.
 

49
52

50

 37

42
इथे काही पडक्या वास्तुचे अवशेष आहेत.
43
इथेच एक पाण्याचे टाकेदेखील दिसते
44


इथे एका झाडाखाली थोडीफार भग्न विष्णुमुर्ती दिसते.
38
 तटबंदीत असे झरोके आहेत.
 


इथेच खालच्या बाजुला गेल्यास पाण्याची तीन टाकी दिसतात.

 ध्वजस्तंभ देखील उभारला आहे पण वाऱ्याच्या वेगामुळे एकही ध्वज यावर पूर्णपणे टिकलेला आढळत नाही. उतरण्याच्या पुढील घसाऱ्यावरून नीट उतरलो की पुढेच दोन टाकी व गवतात असलेले काही घडीव दगड आढळतात.
 
45
दारुगोळा कोठार (?)

     पुन्हा एकदा दगड आणि घसारा पार करत पुढे गेल्यास एक पूर्णपणे उद्ध्वस्त वास्तु आढळते. जमिनीपासून थोडी खाली असलेली ही वास्तु कदाचित दारुगोळा कोठार असावी. छप्पर आणि वरील भिंती नाही आहेत. पण या वास्तुत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत तर काही हाताच्या अंतरावर सपाट बांधकाम आहे.



चिलखती बुरुज
a
बुरुजातील मार्ग
 
41




 
 

    त्यासमोरच राजमाचीचा सुप्रसिद्ध बुरुज आहे. हा बुरुज देखील चिलखती आहे प्रकारचा आहे. चिलखती बांधणी निव्वळ अप्रतिम ! फक्त बुलंदच नव्हे तर तितकीच कोरीव सुध्दा ! दुहेरी तटांचं संरक्षण लाभलेला हा बुरुज अतिशय देखणा आहे. कमानदार भुयारी मार्गाने पायर्‍या उतरत चिलखतात आपण प्रवेश करतो. तिथल्या तटांवर बसून तिन्ही बाजूंची खोल दरी निरखत बसणे मोठे आनंददायी आहे.या बांधणीच्या कारागीरांना सलामी . श्रीवर्धनची उत्तर बाजू म्हणजे या बालेकिल्ल्याची जणू एखादी माची आहे. या माचीच्या बुरुजांना दुहेरी तट घालून संरक्षित केले आहे. या दोन तटा दरम्यान ये-जा करण्यासाठी भुयारी जिनेही जागोजागी ठेवले आहेत. अशा बुरुजांना चिलखती बुरुज म्हटले जाते. 
39
चिलखती बुरुज आणि बुरुजाच्या बाहेरच्या अंगाला असणारी शेरहाजी म्हणजे पहारेकर्‍यांसाठी वावरण्यासाठी असणारी जागा.
40
इथून खाली कातळधार धबधबा दिसतो, पण पावसाळ्यात
51
राजमाचीच्या या उतारावर आणखी काही पाण्याची टाकी दिसतात.
53
कर्जतच्या बाजुला असलेला बुरुज
54
या बुरुजाला देखील खाली उतरण्यासाठी पायर्‍या आहेत.     
a
मांजरसुंबा आणि ढाक
a
नागफणीचे सुळके

      गडावरून या परिसरावर नजर फिरवली, की सुरुवातीला सर्वत्र किर्र्रऽऽ जंगलच दिसते. मग या जंगलातून उसळी घेतलेला ढाकचा किल्ला, नागफणीचे टोक खुणावू लागते. डोंगरांच्या बेचकीतून वळवंड धरणाचे पाणी चमचमू लागते. मांजरसुंभा, शिरवटा जलाशय, कातळधार धबधबा, डुक्करमाळ, तुंगार्ली, खंडाळा, मंकीहिल, नागफणी, दूरवरची माहुली, कर्नाळा आणि माणिकगडाची दुर्गशिखरे ओळखी देऊ लागतात. उल्हास नदीचे खोरे, त्याभोवतीचे तळकोकण एखाद्या नकाशाप्रमाणे भासते. या निसर्गशांततेत समोरच्या खंडाळय़ाच्या डोंगरातून शिट्टय़ा मारत धावणाऱ्या आगगाडय़ा लक्ष वेधून घेतात. हे सारे पाहात आपले लक्ष पुन्हा तळातील उढेवाडी आणि तिच्या शेजारच्या राईच्या तळय़ावर येऊन थांबते.
      राजमाचीचा संपूर्ण परिसर पाहायला एक दिवस पुरतो. सकाळी सुरुवात केली की संपूर्ण किल्ला पाहताना कधी संध्याकाळ होते ते कळतदेखील नाही. दिवस कलायला लागला की तिथला निसर्गही आपले रंग बदलतो. हे बदलणारं रूप मोहक वाटायला लागतं. निसर्गाचं हे सांजरूप आपल्या मनात कुठंतरी खोलवर घर करून बसतं. मग आपसुकच एखादा मुक्काम तिथे पडतो.. आणि मग काय अनोख्या सहय़स्पर्शाने मंतरलेली ही रात्रंसुद्धा सरूच नये असं वाटत राहतं..
     असा हा राजमाची आणि त्याच्या भोवतीचा निसर्ग, वेड लावणारा. शिशिरात तो गोठून जातो, वसंतात पुन्हा बहरतो आणि वर्षांकाळी न्हाऊन निघतो. पावसाळय़ात तर भटक्यांचे हे लाडके स्थळ! झिम्मड पाऊस, ओल्याचिंब वाटा, कोसळत्या धबधब्यांनी वर्षांकाळी हा सारा घाटमाथाच हिरवाईत भिजून जातो. धुक्यात हरवून बसतो. भिजलेली झाडे, शेवाळलेल्या फांद्या आणि गवतफुलांनी झाकलेली पठारे या साऱ्यांनी राजमाची जणू यौवनात पाऊल टाकत असतो. अशा या धुंदवेळी मग या वाटेवर स्वार होणारे प्रत्येक मन राजमाचीच्या प्रेमात बुडून जाते.

डावीकडे दूरवर ढाक व उजवीकडे मांजरसुंभा डोंगर

 संदर्भः-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर
३)  साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची, प्र.के.घाणेकर, स्नेहल प्रकाशन, पुणे
४) माचीवरला बुधा- गो.नि.दांडेकर
५) दुर्गभ्रमणगाथा-  गो.नि.दांडेकर
६) कान्होजी आंग्रे- मनोहर माळगावकर
७) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
८) शोध शिवछत्रपतींच्या किल्ल्यांचा- सतिश अक्कलकोट
९) www.trekshitiz.com  हि वेबसाईट
१०) www.durgbharari.in हि वेबसाईट
११) https://sahyadarshan.blogspot.com/2019/03/rajmachi.html,  https://gadkillebhramti.blogspot.com/2018/01/blog-post31Rajmachifort.html, http://agnihotrisaurabh123.blogspot.com/2017/03/how-to-reach-rajmachi-fort-from-pune.html, https://gadchitre.blogspot.com/2015/07/rajmachi-shrivardhan-fort-and.html,  https://www.misalpav.com/node/11227, https://safarsahyadri.com/2020/07/10/, https://www.maayboli.com/node/13272, https://majhamitra.wordpress.com/, https://www.marathisocial.com/rajmachi-fort-information-in-marathi/,   हे ब्लॉग
 


















At the entrance of village, we can see a board depicting way towards Kondiwade village which is a trek route from Manranjan fort on the Karjat side.
4


 राजमाची (Rajmachi) किल्ल्याची ऊंची :  3600


कोंडाणे लेणी
आता वाजले होते १२:१५! सगळेच निघालो. घाट उतरत असतानाच फोन करून कोंडाणे गांवातील श्री.जगन ठोंबरे यांच्याकडे जेवणाची सोय करून ठेवलेली होती. ती चिंता नव्हतीच.
 
a
२००९ सालच्या सुमारास राजमाचीला उतरणारी नवी वाट घळीच्या बाजूने करण्यात आली. अगदी बैलगाडी जाईल अशी. मात्र गाड्यांसाठी अजूनही ही वाट नाहीच. ह्या वाटेमुळे घळीचा वापर बंद झाला आणि ती वाट पूर्णपणे मोडली. आज ही घळीची वाट झाडोर्‍याने पूर्णपणे भरुन गेलीय. आता गतवर्षीच ती वाट पाहण्याच्या मिषाने घळीच्या मुखाशी गेलो होतो, पूर्वी अगदी परिचित असणारी वाट आज पूर्णपणे अपरिचित वाटत होती. घळीच्या मुखापाशीच एक रिसोर्ट उभं राह्यलंय. आज इथल्या भागाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून गेलाय. जिथून तुंगार्ली धरणाचा चढ सुरु होतो तिथूनच आता कच्च्या रस्त्याऐवजी पक्का डांबरी रस्ता थेट पांगळोलीपर्यंत आलाय. घळीपासची नवी वाट मात्र अजूनही कच्चीच आहे आणि ती तशीच राहावी. राजमाचीला आता कुणेनामामार्गे सर्रास गाड्या येतात जातात, गर्दी वाढतेय, झाडी कमी होतेय तरीही राजमाचीचे सौंदर्य अजूनही उणावले नाही.

चीची (भाग १)


काल दिवसभर केलेल्या मेहनतीने :p पहाटे लवकर उठायचा बेत फसला नि सकाळी सहा वाजता एकमेकांना जबरदस्ती उठवून सर्व विधी आवरून सात वाजता स्वारी किल्ले श्रीवर्धनकडे निघाली.
         सकाळी वाटेवरच छोट्या सापाने दर्शन दिले. त्याला मागे सारत खिंडीतून श्रीवर्धनच्या दिशेने निघालो. श्रीवर्धनकडे जाणारी वाट सुस्पष्ट आहे. गार वारा सुटला होता. तसेच सुर्यदेवांचीही कोवळी किरणे पसरलेली होती. कातळकोरीव पायऱ्यांवरून चालत मुख्य प्रवेशद्वाराला बगल देत फुटलेल्या तटातून गडप्रवेश केला (कदाचित हा गडाचा मागील दरवाजा असावा पण आता उद्ध्वस्त झाल्याने नक्की सांगू शकत नाही).
                    
गडफेरी चालू ठेवत श्रीवर्धनच्या उत्तरेकडील बुरुजावर गेलो. कोवळ्या उन्हात बाबासाहेबांचे शिवकल्याण राजा ऐकत त्यावर तसेच इतर इतिहासावर चर्चा केली. दिपककडून नवनवी माहिती मिळाली. कोवळ्या उन्हातील ढाक बहिरी, मांजरसुंभा पाहत बुरुजाच्या चिलखती बांधणीत प्रवेश केला.
                चिलखती बुरुजामध्ये प्रवेश

चिलखती बांधणी निव्वळ अप्रतिम… फक्त बुलंदच नव्हे तर तितकीच कोरीव सुद्धा… अचंबित करणारे हे बांधकाम राजमाचीची सफर व्याजासहित वसूल करते. या बांधणीच्या कारागीरांना सलामी दिली नि बुरुजाला फेरी मारून पुढे निघालो.
                       चिलखती बुरुज

पुढे असलेल्या उंच दगडावर प्रचंड आलेल्या वाऱ्याने पाटील कसा बसा सावरला व पुढची वाटचाल त्याने सावरत सावरतच केली.
       थोड्याच अंतरावर पाण्याचे टाके लागते. पाणी पिण्यास अयोग्य. याच पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक गंजलेली तोफ आहे. ही तोफ पूर्वी याच टाक्यात पडली होती ती एका दुर्गप्रेमी समूहाने बाहेर काढली.
                        
याच टाक्यांच्या पुढे कड्यालगत दोन पाण्याची टाकी आहेत. पण प्रचंड घसारा आणि वाऱ्याच्या वेगामुळे लांबूनच त्यांचे दर्शन घेत पुढे निघालो. पुढची वाट विविध प्रकारच्या वनस्पतींमधून मार्ग काढत श्रीवर्धनच्या निशाण बुरुजाखाली जाते. निशाण बुरुजाच्या जाण्याच्या वाटेवर एक छोटे कोरलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील पाणी तर अमृताहूनि गोड… कोणालाही दोन घोट जास्त प्यायला वाटावे असेच आहे. थंडगार पाण्याचा आस्वाद घेत पायऱ्यावरून राजमाचीच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो.
                         निशाण बुरुज

इथे काही पडक्या वास्तुचे अवशेष आहेत. ध्वजस्तंभ देखील उभारला आहे पण वाऱ्याच्या वेगामुळे एकही ध्वज यावर पूर्णपणे टिकलेला आढळत नाही. उतरण्याच्या पुढील घसाऱ्यावरून नीट उतरलो की पुढेच दोन टाकी व गवतात असलेले काही घडीव दगड आढळतात.
     पुन्हा एकदा दगड आणि घसारा पार करत पुढे गेल्यास एक पूर्णपणे उद्ध्वस्त वास्तु आढळते. जमिनीपासून थोडी खाली असलेली ही वास्तु कदाचित दारुगोळा कोठार असावी. छप्पर आणि वरील भिंती नाही आहेत. पण या वास्तुत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत तर काही हाताच्या अंतरावर सपाट बांधकाम आहे.
                  
त्यासमोरच राजमाचीचा सुप्रसिद्ध बुरुज आहे. हा बुरुज देखील चिलखती आहे प्रकारचा आहे. बुरुजाच्या समोरच कातळदरा आणि बाजूला पसरलेली राजमाची नि त्या पलीकडे उल्हास नदीची विशाल दरी दिसते.
             सुप्रसिद्ध नैऋत्येकडील बुरुज

दरीकडे पाठ करून आता आमची पावले परतीच्या वाटेला लागली. मनरंजनला समांतर असलेल्या तटांत ठराविक अंतरावर शौचकूप आहेत तसेच चिलखती बुरुज आहेत पण माती निसरडी असल्याने उतरणे धोकादायक आहे. रुंद तटावरून पुढे चालत गेल्यास तटाला लागूनच मोठा तलाव लागतो. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तलावाच्या कडेनेच पुढे चालत गेलो नि दोन खोल्या असलेली गुहा दिसली. ही गुहा आतून प्रशस्त आहे व यावर बाहेरील बाजूस मध्युगीन बांधकाम केलेले आढळते. गुहेपासून थोड्याच अंतरावर दोन खोदीव टाक्यांचा समूह आहे व त्याच्या बाजूलाच एक लोखंडी लाट दुरवस्थेत पडला आहे. इथूनच पुढे जाऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या बुरुजावर गेलो. तिथून वेगवेगळ्या कोनातून फोटो घेतले. प्रवेशद्वाराजवळ अनेक खांब, अवशेष दुरावस्थेत पडलेले आहेत. तसेच प्रवेशद्वाराचा आतील भाग कोसळला आहे. पण तरीही उंची भव्य आहे.
                     प्रवेशद्वाराजवळ

सर्व निरीक्षण करून गड उतरायच्या वाटेला लागलो. वाटेतील वानरसेना आमच्याकडे पाहून आक्रमक झाली. त्यामुळे आम्हालाही पटापट गड उतरणे भाग पडले. (अपने गली में बंदर भी शेर होता है :p ) पुन्हा खिंडीत आलो भैरोबाचे दर्शन घेतले नि गोधनेश्वर मंदिराकडे निघालो.
          
तर मंदिराच्या खांबांची एकसंध रचना, महादेवाकडे तोंड करून विराजमान झालेले नंदी महाराज, कोपऱ्यात असलेली गणपती व देवीची सुंदर मूर्ती आणि गोधनेश्वर महादेवाची सुंदर पिंड हे बघून खरंच सगळे भारावून गेले. मंदिराच्या बाजूला एका ठिकाणी एक कासव व त्याच्या पाठीवर पाऊले कोरलेली समाधी आहे.
                       गोधनेश्वर मंदिर

हे सर्व पाहून माघारी फिरत वाटेतील बंद हनुमानाचे मंदिर पाहत वरे काकांचे घर गाठले. पुन्हा थंडगार पाणी घेत जेवण घेतले. सुभाष दादांचे आभार मानले नि माची उतरायच्या वाटेला लागलो. वाट चुकू नये म्हणून दादा दोन वाटा फुटतात तिथपर्यंत सोडायला आले पुन्हा त्यांचे आभार मानून व पुढील राजमाचीच्या भेटीचे आश्वासन देऊन राजमाचीला बाय-बाय करत कोकणाच्या दिशेने उतरू लागलो.

         मागील दीड दिवस राजमाचीच्या थंड वाऱ्यासोबत होतो. आता मात्र दमट वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. गर्द रानातून जाणाऱ्या ठळक वाटेने कोंढाणे लेणीच्या दिशेने पावले चालू लागली होती.
               कोकणात उतरवणारी वाट

वाटेत हळूच रानातून उल्हास नदी दर्शन देत होती. तिच्या पाण्यात भिजायचं म्हणून पावलांचा वेग अजूनच वाढला होता. वाटेत कोणीतरी वर येताना दिसले तर चक्क साठी पार केलेले शहरी आजी-आजोबा त्यांचा मुलगा, सून आणि नातवासोबत राजमाचीकडे जात होते. एकमेकांची विचारपूस करत दोन्ही गट आपापल्या वाटांना लागलो. पाण्याचे घोट रिचवत, कातळ-गवतातून वाट काढत, कोरड्या धबधब्यावर बसत अखेर वनरक्षकांच्या मार्गदर्शनाने कोंढाणे लेणीपर्यंत पोहोचलो. माचीपासून इथवर यायला सुमारे दीड तासांचा कालावधी गेला.
                        कोंढाणे लेणी

        कोंढाणे लेणी म्हणजे सह्याद्रीचा अत्यंत नाजूक हाताने कोरलेला दागिना. हा दागिना पाहताच कोणीही थक्क होतो. कोंढाणे लेणी ही महाराष्ट्रातील पहिली लेणी आहे असे म्हटले जाते. लेणीत खंडीत झालेला स्तूप आहे. तसेच लाकडी फासळ्या व नक्षीकाम केलेले आहे. बाहेरील बाजूस भिंतीवर प्रेमी युगुलांची खंडीत शिल्प आहेत. वरच्या मजल्यावर प्रशस्त विहार आहेत.  बौद्ध भिक्खू येथे ध्यान व निवास करत असत. दिपककडून यासंदर्भात बरीच माहिती मिळाली. पुढील लेणी पडक्या स्वरुपात आहेत तर शेवटच्या लेण्याची खूप वाताहत झाल्याने तेथे जाण्यास बंदी आहे. लेण्यांचे अतिभव्य रूप तिन्ही डोळ्यात साठवत आम्ही आमच्या वाटेला लागलो.
                  कोंढाणे लेणी pano

जंगलातून वाट तुडवत गप्पागोष्टी करत. थोड्याच वेळात सपाटीवर पोहोचलो नि कोंढाणे गावातील डांबरी रस्त्याने चालत उल्हास नदीत उल्हासात उतरलो.
                   उल्हास नदीचे पात्र

      उल्हास नदीच्या पाण्यात पाय ठेवले नि दोन दिवसाच्या भ्रमंतीचा सर्व क्षीण निघून गेला. पाण्यात मनसोक्त मजामस्ती केली. छोटे मासे पकडण्याचा प्रयत्न केला. पण कसलं काय!! शेवटी मजामस्ती आवरती घेत नदीच्या काठाने डांबरी रस्त्याने चालत मुख्य रस्त्याच्या वाटेला निघालो.

कोंढाणे गावाला खरोखरच निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. उत्तरेला ढाक बहिरी, पूर्वेला सह्याद्री मुख्य रांग, आग्नेयेला राजमाची, दक्षिणेला उल्हासची दरी नि पश्चिमेला वाहणारी उल्हास नदी.. गावात कोकणी पद्धतीची घरे व काही बंगले आहेत. गावातील माणसे तर आपुलकीने चौकशी करणारी… अखेर १ तासाच्या पायपिटी नंतर रिक्षा standवर आलो तिथून टमटमने कर्जत गाठले. पुस्तकांची अदलाबदल केली (आम्ही ट्रेक याचसाठी करतो  ) पुन्हा नव्या भटकंतीची आश्वासने देऊन लोणावळावाले त्यांच्या दिशेने नि आम्ही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालो. समाप्त..


Rajmachi - Trail of wilderness

Mention of Rajmachi brings back memories of my past hike done many years ago in full rainy season. We had left Pune in the heavy rains on our bikes around 10 at night, reached Lonavala around 12 at midnight, asked the route of Rajmachi to few people in Lonavala who gave bewildered expressions on their faces and had advised us not to visit Rajmachi in so much of rains. Finally a good fellow riding on the bicycle had shown us the route and also showed us the temple where we could spend night and also generously offered us to let us park our bikes in front of his little home. We tried our best to sleep in the temple in the village with mosquitoes swarming around but could hardly get any and just waited for dreadful night to pass. Finally we had started hike around 5.30 before the crack of dawn. Actual trek was such a pleasure with lush green surroundings, amazing views and many streams flowing across our ways. We even had a blissful bath in the pond on the way and finally reached to Rajmachi; fully exhausted; only to find out that there were two more citadels to climb. Out of 10, we were only 3 who had completed climb to Shrivardhan rest preferring to rest at the base. Right after visiting Shrivardhan, we took the return journey and came back to the village before 7 in the evening. It was really a marathon trek of more than 30 kms which really tested our stamina. And we were non-regular hikers then; so our subsequent days passed in taking care of our sore legs with blisters on them.

Considering that I am a regular hiker now, I was keen to do this strenuous hike once again. So when Wild Trek Adventure (WTA) group arranged this trek on 25th Aug, I decided to join them. I was more excited to know that we would be hiking from different and steep route from Karjat region.

After my trek was finalized, I got a call from my friend, "Roshan Dusane" who wanted some break from his routine and wanted to join me for the hike. As he hadn't hiked before and had kept himself away from the exercise routine since long, I advised him not to join this strenuous hike but wait for another simple hike later but he was adamant and finally considering his enthusiasm, I relented and decided to take him along.

I picked up Roshan from his residence at Baner and we parked the vehicle at Sancheti Hospital and waited for the pick-up bus to arrive. Soon, the bus arrived and we proceeded towards Karjat. We had a small group of around 15 hikers. I was disappointed to know that Prasad Wagh was not leading the trek as he was not keeping well on that day and had decided to rest. I simply adore two fellow hikers with whom I have hiked before; one is "Onkar Oak" and other is "Prasad Wagh". Both are simply great hikers with a lot of knowledge regarding the history as well as geography of Sahydari. You get to learn a lot if you hike with them.

After a short travel of two hours, we had a small halt near Karjat for breakfast where few of Mumbai members joined us. Soon we passed Kondivade village and reached to Kondhane village which is the starting point of the hike. Weather was almost clear and it was not raining for a change. Surrounding was majestically beautiful.




Already another group had assembled and were ready to start their hike.


We soon had a session where members were asked to introduce themselves and number of hikes they had done already. Few of the members were very new and were hiking for the first time. After instructions from WTA members, we started our hike.




Rajmachi fort is a strategic fort overlooking Borghat(ghat between Mumbai and Pune) which was a historical trade route. Rajmachi peak has two fortified structures - the Shrivardhan Citadel and Manaranjan Citadel.

As we were hiking from Karjat region, we had to climb the height of whole Borghat. Along the way, we planned to visit Kondhane Caves.

Soon after starting the hike from Kondhane village, you come across a small ticket counter en route to Kondhane Caves.



There is a dirt path that you need to follow with the forest on both the sides.

Left to right: Abhijit K, Sachin Sutar, Mufaddal, Atul Ghule


There are many waterfalls and streams along the way.



After a short hike of around 30 minutes or so, we had a first glimpse of Kondhane Caves. Well, the sight was stunning! As it was the middle of monsoon, waterfall was in full flow and looking majestic.





Kondhane Caves: These caves are said to be 200BC-100BC old. Some part of these caves were damaged in the earthquake somewhere in early 1900s; still many of the structures are still intact. Really a place in the real wilderness!

Photo: Sandeep Wadaskar


After witnessing the magnificent Kondhane caves, we proceeded further. As we were moving forward on the trail, we spotted an alternate left side trail which seemed to go down. Assuming that side trail is not the right one, we continued on the main trail. Trail was entering the thick vegetation and was full of scree. We spotted other hikers/tourists on the same trail who wanted to visit Rajmachi. So we continued on the same trail only to reached to a point where the trail reached to a dead end with vertical cliff in front of us. All of us then realized that we were hiking on the wrong route. Well, this was not a great sign considering that we had some new hikers with our group who were already exhausted with such a steep climb. WTA core members asked us to wait and went in different directions to check whether the correct route was nearby. But finally all returned without any success and we all gradually came down to the spot from where we had spotted the side trail. Believe me, it was horrible to walk down through this scree; many of us were slipping and we had to be cautious at each step.

Hike on the wrong route:



Wrong route full of scree and steep ascent:



Finally, we descended  and found the correct route. There is actually a shoe and bottle tied to the tree which is actually a sign of arrow for the direction to Rajmachi. Some innovative hiker has made this sign which we failed to interpret.




Soon we were on the right path that too went through a deep vegetation. It was steep, no doubt and after trudging for another hour, we came to a small plateau and a hut. We just thought that finally we had reached to top only to find out to our dismay that we have climbed just one mountain and there is another to climb. Well, Rajmachi still seemed as distant as the next cosmos.




We got splendid views from this small plateau.




After climbing the second mountain, we reached to plateau of Rajmachi where a deserted hut welcomed us.





It was past 2 in the afternoon and we were incredibly famished and desperately needed a square meal. We moved further towards the village where we could get some lunch. Manaranjana Citadel was looking very enticing along the way.

Soon we returned to the hut where our lunch was being prepared. Unfortunately, lunch was still not ready and we proceeded towards Udaysagar lake and Godhaneshwar Temple.

Trail to visit Udaysagar Lake also goes through the deep forest. This is really part of the country where forest rules.





Finally, lunch was ready and was being served. Some of the trek-mates who did not come with us to visit Udaysagar lake and Godhaneshwar temple already had finished their lunch. We soon went inside a small house and had our lunch of Tandul Bhakari and Bhaji and Dal-Rice. Though it was not so delicious, we had no other option but to gorge on it.


Type: Hill Fort
Time to Explore: Four hours
How to Reach: There are three ways to reach this fort.
1. First way is via Tungarli lake in Lonavala. This is not a motor-able road, so you need park vehicles near Walwan dam and then walk nearly 14 KM. This can be a daunting task specially in rainy season.
2. Second path is via Della Adventure resort. We can take our vehicles via this dirt road but is in extremely pathetic condition. I would not recommend anyone driving vehicle on this route, as it may damage the vehicle too.
3. Third way is via Kondivade village, Kondane caves which lies in Karjat region. One must trek for nearly three hours to reach the fort via this way.
History: This fort has been ruled from Saatavahana period. This shows how ancient the fort was. After medieval period, it was ruled by Adilshahi. During the conquest of Thane, it was won by Chhatrapati Shivaji Maharaj. It was mainly utilized to keep an eye on the trade happening through Bor ghat. Later it was taken over by Britishers; they destroyed the fort to a large extent.
Rajmachi fort is the only fort having two Balekilla (upper fort) namely Manranjan and Shrivardhan. It is a jewel in Sahyadri mountain range. It is surrounded by deep valley from three sides. The base village “Udhewadi” is a small hamlet having population of nearly 300 people. Their main income comes from tourism. You can stay in the rooms or they can arrange the tents as well. Room can cost as low as Rs. 50 per person. Tents depending upon how many people it can accommodate costs between Rs. 500 to 700. The villagers are very helpful and hospitable too.
We started from Pune at 5 PM and took the path via Della Adventure resort. It was a tough and bumpy ride after the resort. Also, it was little scary riding the bike on a dark night and through the jungle. But there were many people going along the way. We waved at a couple asking for directions; they were kind enough to not only show us the way but also asked us to follow them till village. It took us close to One and half hour to complete 14 KM journey. As we reached the village, we came to know that there are wedding celebrations going on and it will go on the whole night.
1
They helped us with our accommodation. We took the room and waited for dinner to get ready. Dinner for one person costs Rs. 70 and it was a very yummy food we had in recent times.
Now we had to get ready to see the most incredible spectacle of mother nature.
The fireflies’ festival!
It occurs only in last fortnight of May and first fortnight of June months. It is a mating season for fireflies. During my childhood, I used to see it in cities but now they are on the path to extinction. We must take measures to protect them.
They can be seen in thousands illuminating on trees continuously. It looked like the stars have come down on the earth. We were extremely happy seeing this event. We explored nearby areas and we could see them on some specific trees only. We spent some quality time observing the light gala. We went back to get some sleep as we had to explore the fort of Rajmachi the next morning. A firefly got into our room.
2
We got up early in the morning. There are toilets behind the house. We ordered for breakfast and walked towards fort. There are many boards installed by MTDC showing the important places in village and on the fort.
We came back to village. By then, our breakfast was ready. We ate the delicious snacks and headed to view other things in the village.
There is an under-construction temple of Lord Hanuman.
55
In front of it, we can see the board displaying way to Konkan Darwaja. There used to be a gate on this side to get down to Konkan region, but it is not there now.


During the daylight, we could see how bad the road condition was and it was really a brave decision to ride a bike here.
61
On the way we can see Ganpati Maruti temple. The border fortification is located here which marks the start of Udhewadi village.

Taking life long beautiful memories, we departed.
You can watch the vlog below.

Leave only your footprints, Take back only pleasant memories.

 
marathisocial.com

राजमाची किल्ला माहिती, Rajmachi Fort Information in Marathi


आजच्या या लेखात, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे राजमाची किल्ला मराठी माहिती निबंध (Rajmachi fort information in Marathi). राजमाची किल्ला हा माहिती निबंध लेख मुलांसाठी आणि सर्व वर्गांसाठी अगदी पहिली पासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे.

तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी राजमाची किल्ला मराठी माहिती निबंध (Rajmachi fort information in Marathi) वापरू शकता. आमच्या या वेबसाइटवर इतर सुद्धा अनेक विषयांवर मराठीमध्ये निबंध उपलब्ध आहे, ते सुद्धा आपण आपण वाचू शकता.

महाराष्ट्रातील लोणावळा आणि खंडाळा या लोकप्रिय दुहेरी हिल स्टेशनच्या वर वसलेला, राजमाची किल्ला हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सर्वात लोकप्रिय आणि सारखे भेट देता येईल असा किल्ला आहे.

राजमाची हे महाराष्ट्रातील कोकण विभागातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले एक छोटेसे गाव आहे. लोणावळा आणि खंडाळा या दोन प्रसिद्ध टेकड्यांजवळ असलेले श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ले – दोन तटबंदी शिखरे असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी राजमाची प्रसिद्ध आहे .

परिचय

महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या राजमाची किल्ल्याला भेट दिल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास कसा होता हे समजूच शकत नाही. राजमाची ज्याला उधेवाडी असेही म्हणतात ते सह्याद्री पर्वतात आढळणारे एक छोटेसे गाव आहे. राजमाचीमध्ये प्रामुख्याने दोन किल्ले आहेत एक श्रीवर्धन किल्ला आणि दुसरा मनरंजन किल्ला.

Rajmachi Fort Information in Marathi.

राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अवघड मार्ग कोंडीवडे गावातून आहे जिथे तुम्हाला सुमारे २००० फूट चढणे आवश्यक आहे आणि सोपा मार्ग लोणावळ्यापासून जात आहे जो फक्त एक साधा पायवाट आहे. राजमाचीचे खरे सौंदर्य पावसाळ्यात दिसते जेव्हा हे ठिकाण पूर्णपणे नवीन रूपात सजते. वाहणारे पाणी, मोत्यासारखे धबधबे आणि हिरवीगार राने दिसतात जे डोळ्यांना आनंद देणारे आहे.

राजमाची किल्ल्याचा इतिहास

सातवाहनांनी बांधलेल्या, ऐतिहासिक अशा राजमाची किल्ल्याला एक मनोरंजक इतिहास आहे. हा किल्ला सातवाहनांनी बांधला होता परंतु शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये हा किल्ला आणि आजूबाजूचे किल्ले विजापूरच्या आदिलशाही शासकाकडून ताब्यात घेतले.

१७०४ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने पुन्हा मराठ्यांकडून किल्ला ताब्यात घेतला. पुढच्याच वर्षी मराठ्यांनी पुन्हा ताबा मिळवला आणि नंतर १७१३ मध्ये शाहू महाराजांनी राजमाची किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला. १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्यावर, इंग्रजांनी मराठा प्रदेश आणि राजमाची किल्लाही ताब्यात घेतला.

१८ व्या शतकात, हा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता, जो सध्याच्या मुंबई आणि पुण्याला जोडणारा होता. १९ व्या शतकात इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतला. आणि, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

राजमाची किल्ल्याची रचना

किल्ल्यातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याची वेगळी वास्तुकला, जी विविध स्थापत्यशैलींचे मिश्रण आहे ज्यांनी विविध कालखंडात त्यावर राज्य केले. या भव्य वास्तूमध्ये गुप्त प्रवेशद्वार, भक्कम भिंती, पाण्याचे साठे, निवासी ठिकाणे, प्रशासकीय केंद्रे, मंदिरे आणि भारतीय शैलीत बांधलेले दोन गड आहेत जे म्हणजे मनरंजन किल्ला आणि श्रीवर्धन किल्ला.

किल्ल्याचा आवारातील मंदिरे देखील पाहण्यासारखी आहेत. दोन किल्ल्यांमधील एका घाटावर वसलेले हेमदपंती-शैलीतील शिव मंदिर आणि कालभैरव मंदिर यांचा काही उत्तमोत्तम समावेश होतो.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोंडाणा लेणी, जो १६ बौद्ध लेण्यांचा समूह आहे जो किल्ल्यापासून काही अंतरावर आहे. इ.स.पू. १ ल्या शतकातील, या लेण्या आहेत, ज्यात गुंतागुंतीचे कोरीवकाम, खांब आणि धबधबे आहेत जे त्यांचे सौंदर्य वाढवतात.

राजमाची किल्ल्याच्या आजूबाजूला पाहण्याच्या गोष्टी

राजमाची किल्ल्यावरून शिरोटा धरण आणि सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य दिसते. किल्ला पाहिल्यानंतर वेळ असेल तर तुम्ही लोणावळातील महत्वाचे पॉईंट्स पाहू शकता.

राजमाची किल्ला उघडण्याच्या/बंद होण्याची वेळ आणि दिवस

राजमाची किल्ला आठवड्यातील सर्व दिवस खुला असतो. किल्ल्यावर कोणतेही प्रवेश शुल्क नाही.


राजमाची किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

राजमाची किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सप्टेंबर ते मार्च या महिना आहे, जेव्हा वातावरण थोडे थंड असते.

निष्कर्ष

राजमाची किल्ला हा मुंबई पुण्यामधील पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध आकर्षण आहे, यात श्रीवर्धन आणि मनरंजन किल्ले असे दोन किल्ले आहेत. विस्तीर्ण पठाराने वेढलेल्या या किल्ल्यातून बोर घाट दिसतो जो पूर्वी मुंबई आणि पुण्याला जोडणारा प्रमुख व्यापारी मार्ग होता.

https://www.marathisocial.com/rajmachi-fort-information-in-marathi/

 राजमाची! बोरघाटाचा रक्षक

पावसाळा जवळ आला, की भटक्यांना ज्या काही ठरावीक स्थळांची आठवण होते त्यात लोणावळय़ाजवळील राजमाची हा एक वनदुर्ग आहे. डोंगर, जंगल झाडी आणि त्यात दडलेल्या या बेलाग दुर्गाची भ्रमंती..
मावळातल्या अनेक वाडय़ावस्त्यांना बैलगाडीरस्त्याने जोडलेले आहे. डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यातून वाहणाऱ्या या वाटांवरील प्रवास एक वेगळी भेट असते. इथला निसर्ग, ओढेनाले, झाडेझुडपे, पशुपक्षी अगदी वाटेत भेटणारे गावकरी हे सारेच विश्व वेगळे असते. चालणाऱ्याला यातील सौंदर्य आणि वैविध्य समजले, की तो या वाटांचा गुलाम होतो. लोणावळय़ाच्या उत्तरेला उढेवाडी नावाच्या छोटय़ा गावापर्यंत अशीच एक वाट जंगलझाडीतून गेली आहे. जिच्या शिरावर बसला आहे एक देखणा किल्ला- राजमाची! इतिहासकाळापासून वाहत्या असलेल्या बोरघाटाचा हा रक्षक!
खंडाळा घाटातून रेल्वेने जाताना किंवा लोणावळय़ाजवळच्या राजमाची पॉइंटवर आलो, की जंगलझाडीतला हा गड आणि त्याची ती जुळी शिखरे श्रीवर्धन-मनरंजन लक्ष वेधून घेतात. राजमाचीच्या या वैशिष्टय़पूर्ण भूरचनेमुळे पाहणाऱ्या प्रत्येकालाच हा गड आकर्षित करतो. पण समोर दिसणाऱ्या या गडाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी मात्र तब्बल १६ किलोमीटरची पायपीट करण्याची तयारी ठेवावी लागते. लोणावळा, तुंगार्ली गाव, धरण, ठाकुरवाडी मार्गे जाणारी ही वाट! या वाटेला अध्र्या वाटेत खंडाळामार्गेही एक वाट येऊन मिळते. ज्यांना डोंगरदऱ्या खालीवर करण्याची हौस आणि सवय आहे, अशांसाठी आणखी काही आडवाटा आहेत. कर्जतहून सहाआसनी रिक्षाने कोंदिवडे किंवा कोंडाणे गाव जवळ करायचे किंवा घाटातील ठाकुरवाडी नामक रेल्वेच्या अल्पकाळासाठीच्या छोटय़ाशा थांब्यावर पटकन उतरायचे आणि समोरची उल्हास दरी उतरत राजमाचीच्या डोंगराला भिडायचे. यापैकी कुठल्याही मार्गे आलो तरी अंगावर येणारी दीड-दोन हजार फुटांची सरळ चढण चढावी लागते.
राजमाचीकडे निघालो, की भवतालची हिरवाईच आपले मन जिंकून घेते. यातही लोणावळय़ाकडून आलेल्या वाटेवर तर जास्तच! साग, ऐन, आंबा, जांभूळ, बेहडा, सावर, बहावा, पळस, पांगारा, कुडा, कुंभा, उंबर.. वाघाटी, पळसवेल, करवंद-बांबूची जाळी आणि अशाच किती वृक्षवेली वनस्पती! या साऱ्या वनस्पतींनी हे जंगल घट्ट केले आहे. पुन्हा या झाडीत नानातऱ्हेचे पशुपक्षी, कीटक, फुलपाखरे; ओढय़ानाल्यासारख्या नाना परिसंस्था! या साऱ्यांमुळे राजमाचीच्या वाटेवर प्रवेश होताच हा निसर्गच पहिल्यांदा वेड लावून टाकतो. लोणावळय़ाच्या बाजूने आलो, की गड येण्यापूर्वी अलीकडेच काही अंतरावर तळातील तटबंदी आपला रस्ता अडवते. गडाची ही वेस! ती आता पाडून रस्ता केला आहे. पण बाजूच्या बलदंड भिंती पाहिल्या की त्या काळीच्या दरवाजाचा अंदाज येतो. या वेशीच्या आत शिरताच डाव्या हाताला गणेश, मारुतीचे मंदिर आहे. पुढे काही अंतरावर सतीच्या शिळाही आहेत. जणू गडाचे हे पहिले पहारेकरीच! ही वेस ओलांडली की राजमाचीची हद्द सुरू. गडाची ही माची. या माचीवर मधोमध ते दोन बेलाग बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन! यातील श्रीवर्धन आपल्यावर लक्ष ठेवून असतो.
वाट काही वेळातच पायथ्याच्या उढेवाडी गावात पोहोचते. दहा-वीस घरांची ही वाडी पण प्रत्येकाचे अंगण अगदी साफसूफ, शेणामातीने सारवलेले. त्यावर झावळय़ांचे मांडव घातलेले. यातल्याच एखाद्या घरी आपली पथारी लावायची आणि राजमाची हिंडायला बाहेर पडायचे. उढेवाडीला खेटूनच एक दाट राई आहे. या राईत एक बांधीव तलाव आणि त्याच्या काठावर मध्ययुगीन महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागे डोंगरातून येणारा एक झरा गोमुखाद्वारे मंदिराच्या पुढय़ातील टाकीत पडतो आणि पुढे मुख्य तलावाला जाऊन मिळतो. हा तलाव दंडा राजपुरीच्या कुणा देशमुखाने शके १७१२ मध्ये बांधला आहे. या आशयाचा एक शिलालेखच या तळय़ाच्या काठावर आहे. या तलावाच्या काठावर आले की त्याच्या त्या स्वच्छ नितळ अशा पाण्यात साऱ्या राजमाचीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. पाण्यातले त्याचे हे रूप पाहावे आणि मग प्रत्यक्ष दर्शनासाठी गडाकडे निघावे.
या उढेवाडीतूनच डोक्यावरच्या श्रीवर्धन-मनरंजन बालेकिल्ल्यांकडे वाट निघते. कडय़ात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, अर्धवट लेणी यांचे सान्निध्य घेत ही वाट दोन बालेकिल्ल्यांच्या मधल्या खिंडीत येऊन थांबते. या खिंडीत भैरवनाथाचे एक प्रशस्त मंदिर आहे. गडावरील मुक्कामासाठी वाडीशिवाय हाही एक पर्याय! मंदिरात भैरव आणि जोगेश्वरीच्या मूर्ती! छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज आणि थोरले बाजीराव पेशवे यांनी वेगवेगळय़ा काळात त्या अर्पण केलेल्या. मंदिरासमोर गडावरील तोफा ठेवलेल्या आहेत. याशिवाय दीपमाळ, भोवतीने काही कोरीव शिल्पंदेखील आहेत. यातील गजान्तलक्ष्मीचे शिल्प तर पाहण्यासारखे.
दोन बालेकिल्ले असणारा राजमाची हा महाराष्ट्रातील एकमेव किल्ला. यातील श्रीवर्धन हा उंचीने थोडासा उंच! यावर जाण्यासाठी खडकातच पायऱ्यांचा मार्ग खोदलेला आहे. गोमुखी पद्धतीच्या प्रवेशद्वारातून आत शिरताच दोन्ही बाजूंची देवडी थक्क करून सोडते. वळणावळणाच्या मार्गावरील प्रशस्त आकाराची, रेखीव खांबांवर उभी असलेली ही देवडी पूर्वी बहुमजली होती. पण आता तिचे छत पूर्ण कोसळले आहे. किमान तिच्या उभ्या िभती आणि खांब ढासळण्या-पडण्यापूर्वी तरी वाचवायला हवेत. पण हे करायचे कोणी..?
या दरवाजातून गडावर सरकावे तो डाव्या हाताला खडकात खोदलेली काही टाकी दिसतात. या टाक्यांच्या कडेलाच एक लोहस्तंभ पडलेला आहे. अंदाजे ८ फूट लांबीच्या या लोहस्तंभाचे नेमके प्रयोजन मात्र कळत नाही. रायगडावर देखील असाच एक स्तंभ आहे. आमच्या गडांवरील या अशा वस्तूंचे योग्य जतन आणि संशोधन व्हायला हवे.
या टाकीजवळून निघालेली ही वाट पुढे एका शैलगृहाजवळ थांबते. या मूळच्या शैलगृहांची मध्ययुगात धान्याची कोठारे झाली. या शैलगृहाच्या दरवाजांवर गणेशपट्टी आणि कमळे कोरलेली आहेत. ही वाट पुढे श्रीवर्धनच्या शिखराकडे निघते. वाटेत आणखी काही उद्ध्वस्त घरांचे अवशेष, बुजलेल्या टाक्या, विष्णूचे एक छतविना छोटेसे मंदिर आणि गडाची सदर लागते. या साऱ्यांतून मार्ग काढत आपण गडाच्या सर्वोच्च अशा ढालकाठीच्या वा टेहळणीच्या बुरुजावर येतो. या बुरुजावर आता नव्याने ध्वजस्तंभ उभारला आहे. या बुरुजावरून सारा राजमाची किल्ला आणि परिसर नजरेत येतो.
श्रीवर्धनची उत्तर बाजू म्हणजे या बालेकिल्ल्याची जणू एखादी माची आहे. या माचीच्या बुरुजांना दुहेरी तट घालून संरक्षित केले आहे. या दोन तटा दरम्यान ये-जा करण्यासाठी भुयारी जिनेही जागोजागी ठेवले आहेत. अशा बुरुजांना चिलखती बुरुज म्हटले जाते. श्रीवर्धनच्या तुलनेत उंचीने कमी असलेल्या मनरंजनला स्वयंसिद्ध अशी रक्षणाची साधने नसल्याने त्याच्या सभोवार मजबूत तट घातला आहे. एकापाठोपाठ तीन दरवाजांतून मनरंजनमध्ये प्रवेश करावा लागतो. गडाच्या आत विस्तीर्ण पठार असून त्यामध्ये दोन मोठे तलाव, दारूगोळय़ाचे कोठार, किल्लेदाराच्या उद्ध्वस्त वाडय़ाचे अवशेष, सदर आदी वास्तू दिसतात. या अवशेषांमध्येच छत नसलेली, पण भिंती शाबूत असलेली एक इमारत लक्ष वेधून घेते. या इमारतीच्या प्रवेशद्वारावरील सुरेख गणेशपट्टी, बाजूचे चंद्र, सूर्य या शुभचिन्हांमुळे गडावरील ही एखादी महत्त्वाची वास्तू वाटते. मनरंजनवरून पश्चिमेकडचा देखावा खूपच रमणीय दिसतो म्हणूनही या बालेकिल्ल्याला ‘मनरंजन’ म्हणतात, असेही सांगितले जाते. राजमाची किल्ल्याचा हा परिसर पाहून मन नकळतपणे त्याच्या इतिहासात डोकावते. या किल्ल्याला फार ज्वलंत नसला, तरी प्रदीर्घ असा इतिहास आहे. गडाच्या पोटात ठिकठिकाणी खोदलेली शैलगृहे, पाण्याच्या टाक्या आणि मुख्य म्हणजे या गडाशेजारीच असलेली कोंडाणे लेणी या साऱ्या खाणाखुणा या गडाला प्राचीन काळापर्यंत घेऊन जातात. या गडाजवळून वाहणारा बोर घाट हा प्राचीन काळापासूनच वाहता आहे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठीच या गडाची निर्मिती झाली. हे निश्चित! हा काळ बहुधा सातवाहनांचा म्हणजेच दोन हजार वर्षांपूर्वीचा! यानंतर राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, मुस्लिम सत्ताही या गडावर नांदून गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजही एकदोनदा गडावर आल्याचे उल्लेख आहेत. पुढे आलमगिरीची वावटळ सहय़ाद्रीत अवतरताच इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाच्या सेनापतीने राजमाचीच्या किल्लेदारास वश करून हा गड जिंकला खरा; पण औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी राजमाचीवर पुन्हा जरीपटका फडकवला. इसवी सन १७१३ मध्ये शाहूमहाराजांनी दर्यासारंग कान्होजी आंग्रेंकडे गडाची सूत्रे दिली. पुढे त्यांनी तो १७३० मध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांकडे सुपूर्द केला. यानंतरच्या काळात इसवी सन १७७६ मध्ये सदाशिवराव भाऊंच्या तोतयाचे (सदोबा नावाचा एक ब्राह्मण) प्रकरणही या गडावर मोठे गाजले. या तोतयाने कोकणातून बंडाळी करत राजमाचीपर्यंतचा भाग ताब्यात घेतला. पुढे पेशव्यांनी आंग्य््राांच्या मदतीने या तोतयाचा बंदोबस्त केला. असा हा राजमाची गड आणि त्याचा इतिहास!
पण इथे आलो की या इतिहासापेक्षाही राजमाचीचा भवतालच जास्त लक्षात राहतो.

 

राजमाची किल्ला

Posted on Updated on

Rajmachi killa

राजमाची किल्ला हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येतांना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योद्ध्याचे स्मारक, अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतिरायाची मूर्ती आहे. किल्लावरून आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे तिला ‘उधेवाडी’ असे म्हणतात.

  • उदयसागर तलाव : पावसाळ्यात हा किल्ला मात्र ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील टेकाडं खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणाऱ्या धबधब्याचे सुंदर दृष्य दिसते. हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस या आल्हाददायक वातावरणामुळे मनोमनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतात.
    पलिकडे खळाळे इर्मळ निळसर पाणी
    उतुंग तरुंची उभी सभोती श्रेणी
    एकाकी धूसर पाऊलवाट मधे ही
    तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी.
  • मनरंजन : उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहचतो. मनरंजनवर जाणारी वाट सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. किल्ल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडीबांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.
  • श्रीवर्धन : राजमाचीच्या असणाऱ्या दोन बालेकिल्ल्यापैकी सर्वात उंच असा हा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजुला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे दारुगोळ्याचे कोठार आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोट्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो.
  • शंकराचे मंदिर : तलावाच्या पश्चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या टाक्यांमध्ये पडते. सध्या या मंदिराच्या उत्खननाचे काम गावकऱ्यांनी हाती घेतलेले आहे. राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती ‘कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडील डोंगराला ‘भैरव डोंगर’ म्हणतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन. बालेकिल्ल्याकडे जातांना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखलपट्टी आहे. यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच ३ दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे.

गडावर जाण्याच्या वाटा :

  • लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे : लोणावळ्याहून तुगांर्ली मार्गे राजमाची गावात यावे. ही वाट १९ कि.मी. ची आहे. वाटेने किल्लावर जाण्यास पाच तास लागतात.
  • कर्जतहून कोंदीवडे मार्गे : कर्जतहून कोंदीवडे या गावात बसने यावे. इथून गडावर जाण्यास सुमारे ३ ते ४ तास लागतात.

https://majhamitra.wordpress.com/2017/06/03/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/

थोड्याच वेळात आम्ही एका पत्राचे छ्प्पर असलेल्या भैरवनाथाच्या मंदिराजवळ येउन पोचलो. हे मंदिर दोन्हि किल्ल्यांच्या बरोबर मध्ये आहे. येथुनच डावीकडची वाट मनरंजन किल्ल्याला जाते तर उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्याला जाते. मंदिरासमोरच दोन तीन तम्बु उभारलेले होते. चोउकशी करता कळले कि मुम्बइच्या एका शाळेतील मुले राजमाचीवर रॅपलींग करण्यासाठी आलेली आहेत. त्यांना मागे टाकुन उजवीकडच्या वाटेने श्रीवर्धनवर चढाई करण्यास सुरवात केली. चढ जास्त मोठा नसल्याने लवकरच श्रीवर्धनच्या लपविलेल्या दरवाज्याजवळ येउन पोचलो. दरवाजा पडलेल्या अवस्थेतच होता, दरवाज्याच्या आत पहरेकरयांच्या पडलेल्या देवड्या होत्या. येथुन पुढे अजुन एका कोरीव गुहेजवळ येउन पोचलो. जवळच हिरवे पाणी असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या होत्या. येथे दोन तीन ग्रुप फोटो काढुन पुढे श्रीवर्धनच्या व राजमाचीच्या सर्वात उंच जागी येउन पोहचलो.
Guha.jpgगुहा व गँग

किल्ल्याच्या सर्वात उंच जागी असल्यामुळे चहुकडचे बघता येत होते. समोरच बुटका मनरंजन, त्याचा पलीकडे ढाकचा किल्ला व कळकरायाचा सुळका दिसत होता. थोडे नीट बघीतल्यावर ढाकच्या बहिरीची गुहा पण दिसत होती. मनातच परत एकदा ढाकच्या बहिरीला भेट द्यायचे ठरविले. डाव्या बाजुच्या डोंगरवर एक मेल गाडी पुण्याच्या दिशेने जाताना दिसत होती. खाली उल्हास नदिचे लांबवर पसरलेले खोरे दिसत होते. पावसाळ्यात तुडुंब भरुन वाहणारया नदिला फारच थोडे पाणी दिसत होते. मागे वळुन पाहिल्यास समोर थोड्या डाव्या बाजुस वळवण, तुंगार्ली लेक व बराच दुर अंधुक विसापुर किल्ला दिसत होता. समोरच आम्हि रात्री वळसा घालुन चालुन आलेली वाट, थोडया दुर अंतरावर आकाशात थेट घुसलेला डुयकस नोजचा सुळका दिसत होता. या जागी काहि फोटो काढल्यावर उतरुन सर्व जण कील्ल्याच्या बरयापैकी शाबुत तटबंदीवर प्रदक्षिणा घालण्यास निघाले.
dhaak.jpgढाकचा बहिरी

प्रदक्षिणा घालता घालता एका चिलखती बुरुजाजवळ येउन पोचलो. या बुरुजावर बाहेरील बाजुस जाण्यास एक चिंचोळी वाट होती. या वाटेतुन खाली उतरताना एखाद्या छोट्या गुहेत गेल्याचा अनुभव येत होता. ही वाट चिलखती बुरुजाच्या दोन्हि भिंतीमध्ये घेउन जाते. तेथे पोचल्यावर राजगडाच्या संजिवनी माचीच्या बुरजांची आठ्वण झाली. एव्हाना एक वाजला होता व पोटत कावळे ओरडण्यास सुरवात झाली होती. तेथुन बाहेर पडुन कील्ल्याच्या तटबंदीवर चालत चालत बाहेर निघालो. बाहेर पडता पडता मध्येच तटबंदिवर एक मार्ग बाहेर जाताना दिसला. कुतुहल म्हणुन पुढे गेलो तर ती वाट एका अंधारया गुहेजवळ जाउन संपली. गुहा बरयापैकी प्रश्स्त व बरयाच आत जात होती. थोडे पुढे गेलो तर वटवाघुळ्यांच्या लीदेचा वास आला. लगेच मागे फिरुन तट्बंदीमार्गे महादरवाज्या बाहेर पडलो. वाटेत भैरवनाथाचे दर्शन घेउन आल्या वाटेला परत फिरलो. मुक्कामाच्या ठिकाणावर पोहचण्याच्या आधी वाटेत एका टपरीवर दोन ग्लास लिंबु सरबत रीचवले. मुक्कामाच्या ठिकाणावर जेवण्याची तयारी झालेली होती. गरम गरम फ्लॉवर-बटाटा भाजी, चपाती, भात, वरण, पापड, लोणचे चापुन थोडा आराम करण्यास मॅटवर पहुड्लो.
chilkhati.jpgचिलखती बुरुज
buruj.jpgचिलखती बुरुज- प्रवेश

सन्ध्याकाळी ४ वाजता चहा घेउन मनरंजन किल्ल्याला भेट देण्यास निघालो. बरोबरचे काही साथिदार दमल्यामुळे गळाले होते आणि रात्री २८ जणांच्या ग्रुप मधील फक्त १८ जण मनरंजनला जायला निघालो. आमच्या लीडरने घोषणा केली कि आपण नेहमीच्या रुळलेल्या वाटेने न जाता एका वेगळ्या वाटेने मनोरंजन चढणार आहोत. ही वाट मनरंजनच्या डाव्या अंगावरुन चढुन, एक छोटा टॅव्हर्स घेउन मनोरंजनच्या नेहमीच्या वाटेला भेटते. थोड्याच वेळात या वाटेने एका भल्या मोठ्या बुरुजाजवळ येउन पोचलो. किल्ल्यावर जाण्याचा दरवाजा या बुरुजाच्या उजव्या बाजुने आहे. या दरवाज्याने आत जाउन आम्ही सरळ बुरुजाच्या माथ्यावर जाउन पोचलो. जेथुन समोर ज्या वाटेने आलो ती वाट व खाली चिमुकले राजमाची गाव दिसत होते. गावापासुन दुरवर कौडिण्येश्वरचे जुने देउळ व समोरील तलाव दिसत होता. थोडा वेळ बुरुजावर घालवुन उरलेला किल्ला पाहण्यास निघालो. बुरुजावरुन मागे फिरुन पुढे सरळ जाता डाव्या हाताला एक छप्पर नसलेले मोठे बांधकाम दिसते. राजमाचीवरील हेच एक शाबुत असलेले बांधकाम असुन ह्याचा दरवाजा मागच्या बाजुने आहे. दरवाज्यावर गणेश, कमळ, सुर्य, चन्द्र ही शुभचिन्हे कोरलेली दिसत होती. बांधकामाच्या आकारावरुन तो किल्लेदारा वाडा असावा असे वाटत होते.
buruj-manorajnan.jpgबुरुज - मनरंजन
vaada.jpgवाडा - मनरंजन

इथुनच पुढे एक हिरवे पाणी असलेला बांधिव तलाव लागला. तलावाकाठी दोन-तीन शाळुंका नसलेल्या शंकर पिंडिका, भग्न नंदी, काही कोरीव दगड व एक चुण्याच्या घाण्याचा मोठा गोल दगड पडलेला दिसला. तिथुनच पुढे असलेल्या एका सुक्या टाक्याच्या शेजारी सर्वजण सुर्यास्त पाहण्यास बसले. आयोजकांकडुन परत एकदा सर्वांना ठेपला आणि स्पेशल छूंदा याचा आहार देण्यात आला. ढग असल्यामुळे सुर्यास्त काही चांगला दिसला नाही. सर्वजण परत आल्या वाटेने परत निघाले. मुक्कामाला पोचेपर्यन्त गडद अंधार झाला होता.

रात्री गरमागरम पिठलं-भाकरी जेऊन सर्वजण "Dumb Sharrads" खेळायला बसले. एक-दोन डाव होतात तोच लाईट गेले. चोउकशी करता कळले की गावात फक्त दिवसातुन दोनच तास वीज असते, तीही मराविमंची नव्हे तर गावकर्‍यांनी स्वतः बसविलेल्या सोलार लाईट यंत्रणेची. पावसाळ्यात तर ढगांमुळे हि देखिल वीज नसते. सम्पुर्ण गाव चार ते पाच महिने अंधारात असतो. आयोजकांपैकी एकाने लगेच पेट्रोमॅक्स कंदिल आणुन मध्ये ठेवला. त्याच्या उजेडात खेळ परत सुरु झाला. पुढे आलाम आरा, काबुलीवाला, सल्तनत, नटरंग इ. चित्रपटांची नावे घेत खेळ चालला तो सर्वांना झोप येई पर्यन्त.
morning.jpgसुप्रभात

सकाळी लवकर उठुन निवडक जण "ऊदय सागर" तलावावर स्नान करण्यास निघालो. हा तलाव गावापासुन जवळच पाच्-दहा मिनीटे अंतरावर आहे. तलावाच्या काठीच कौडिण्येश्वरचे जुने देउळ आहे. तलावाच्या पाण्यात थोडा वेळ मस्ती व स्नान करुन कौडिण्येश्वराच्या दर्शनास निघालो. हे आटोपशीर देउळ पुर्णपणे दगडी बांधणीचे आहे. असे सांगतात की काही वर्षापर्यन्त हे देउळ अर्धे मातीत गाडलेले होते. गावकर्‍यांच्या प्रयत्नाने आता ते सुस्थितीत आहे. देउळाच्या समोरच एक टाके आहे ज्यात गोमुखातुन थेंब थेंब पाणी पडत होते. समोरच एक कोरीव दगडी स्तंभ उभा केलेला आहे. इथुनच पुढे चालत थोड्या अंतरवर दरीच्या टोकाशी जाता जेते. दरीच्या टोकावरुन उल्हास नदीचे खोरे, मुम्बई-पुणे रेल्वे लाईन, डयुकस नोजचा सुळका, मागे पाहिले असता मनरंजन व श्रीवर्धन दोन्ही बालेकिल्ले यांचे स्पष्ट दर्शन होते. थोडा वेळ तेथे घालविल्यानन्तर सर्व जण मागे फिरुन नाश्ता करुन परत कोंढाणे-कर्जत मार्गे मुम्बईस येण्यास तयार झाले.
udaysagar.jpgऊदयसागर

mandir.jpgकौडिण्येश्वर


परत येताना आमचा मार्ग कोंढाणे लेण्यांमार्गे सरळ कोकणात उतरणारा होता. ह्या वाटेने जाण्यासाठी सर्वजण राजमाची गावाच्या मागील बाजुस कड्यापाशी येउन जमले. येथुण तीव्र उताराची एक वाट सरळ कोकणात उतरते. प्रमुखातः मातीची असलेली हि वाट पावसाळा सोडुण इत्तर त्रुतुत उतरण्यासाठी सोपी आहे. परन्तु योग्य काळजी न घेतल्यास एक दोन ठिकाणी फसविणारी देखिल आहे. या वाटेने आम्ही जवळपास दहा वाजता उतरण्यास सुरवात केली. सुर्याच्या विरुध्ध बाजुस असल्याने ऊन्हाचा त्रास नव्हता पण वारा जोरदार सुटला होता. हळु-हळु सर्वांनी उतरण्यास सुरवात केली. जागोजागी निळी, सफेद, पिवळी रानफुले दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही एका छोट्या पठारावर येउन पोचलो. येथे एक वाट उजवीकडे जाते, त्या वाटेवरुन पुढे गेल्यास दोन लहान पाण्याची टाकी व जवळच उतारावर एक छोटे देउळ दिसते. आमच्या लीडरच्या मते ही ए़क राबता न राहिलेली कोकणातुन येणारी वाट होती.
raan.jpgरानफुले

हि जागा मागे टाकुन, दोन डोंगर उतरुन परत एका छोट्या पठारावर येउन पोचलो. इथुन आम्हाला डावीकडे कोंढाणे लेण्यांकडे जायला वळायचे होते, पुर्णं ग्रुप जमा झाल्यावर आम्ही डावीकडे वळलो. दहाच मिनीटात एक सुका ओढा ओलांडुन लेण्यांजवळ पोचलो. लेण्यांजवळ ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजचा राष्ट्रिय सेवा योजनेचा एक ग्रुप लेण्यांची सफाई करत होता. त्यांनी जमवलेल्या कचर्‍यात प्लाष्टिक बॉटल्स, पिशव्या, गुटख्याची व सिगारेटची पाकिटे ई. मालमसाला दिसत होता. मनात आले अजुनही आपल्या जन्तेत ऐतिहासिक वारश्याची जपणुक करण्याची मानसिकता निर्माण झालेली नाही. थोडे वाईट वाट्ले.
cave.jpgलेणी

कोंढाण्याची ही बोउध लेणी ख्रिस्तपुर्व सुमारे २०० वर्षांपुर्वी खोदलेली आहेत. यात पुर्ण दगडात खोदलेले एक चैत्यगृह आणि आठ विहार आहेत. डोंगराच्या खालच्या भागात खोदल्याने पाणी झिरपुन लेण्यांची भरपुर नासधुस झालेली दिसत होती. या लेण्यांपासुन बोध घेऊन या नन्तरची कार्ला, भाजे, बेडसे लेणी डोंगराच्या वरच्या भागात खोदली गेली. पावसाळ्यात या लेण्यांवरुन एक सुदर धबधबा खाली कोसळतो.
त्यातल्या त्यात चांगल्या अवस्थेत असलेली लेणी पाहुन, दोन चार फोटो काढुन सर्वजण आल्या रस्त्याने मागे वळुन १५ ते २० मिनीटत खाली कोंढाणे गावात उतरलो. 

https://www.maayboli.com/node/13272

राजमाची संवर्धन मोहीम 2

“इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो केवळ एक भूमीखंड असतो.मात्र इतिहासाचा दिप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते.इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे.तो आपल्याला जाणवायला हवा मगच ही दुर्ग यात्रा सुफळ संपूर्ण होते एरवी नुसती पायपिट होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून किल्ले राजमाची श्रीवर्धन बालेकिल्ला चिलखती बुरूजाचे चोरदिंडी दरवाजा संवर्धन मोहिम क्रमांक २ यशस्वी पार पडली आणि दरवाजांना मोकळा श्वास मिळाला यासाठी राबलेल्या सर्व हातांचे खूप खूप धन्यवाद ❣️ 🙏

सफरसह्याद्रीट्रेकर्स

भटक्यांचेअनोखेजग

Post navigation

https://safarsahyadri.com/2020/07/10/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE-2/

 

शनिवारी २७ ला रात्री राजमाचीला जायचे ठरले व आम्ही चौघे रात्री १०.३० च्या लोकल ट्रेनने ११.४५ ला लोनावळ्यात उतरलो. तिथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आलो. पुण्याच्या दिशेने काही अंतर पुढेच एक पेट्रोल पंप लागतो. तिथून डावीकडे वळून गुरुकुल मागे टाकून आम्ही तुंगार्ली गावात आलो. तिथून पुढे दृतगती महामार्गाच्या खालून जात आम्ही डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. साधारण ४० मिनिटात रेल्वे स्टेशनपासून इथवर येता येते. डोंगर चढून आम्ही तुंगार्ली धरणाची भिंत उजवीकडे ठेवत पांगोळली गावात पोहोचलो. गाव संपताच एक घळ सुरु व्हायची. तो उतार संपला की थेट राजमाचीच मुख्य रस्ता लागायचा. पण आता मात्र घळिच्या बाजूने चारचाकी जाईल असा कच्चा रूंद रस्ताच बनवला आहे. त्यामुळे वापरात नसल्यामुळे घळीचा रस्ता बुजला आहे. आम्ही त्या रस्त्याने निघालो. आता पौणिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले श्रीवर्धन-मनरंजन स्पष्ट दिसत होते. आता अजून बरेच अंतर चालायचे होते. रस्ता अनोख्या निसर्गसौंदर्‍याची अनुभूती देत होता. उजवीकडे सरळसोट कडा व डावीकडे खोल दरी असे आम्ही बरेच अंतर चालून गेलो.


वाटेत रातपक्षी, भेकरांचे आवाज चालूच होते. आता एक दाट जंगलाचा टप्पा सुरु झाला होता. विजेरीच्या साहाय्याने तो पार करून आम्ही एका फाट्यावर आलो. इथून सरळ जाणारा रस्ता ढाकच्या बहिरीला जातो व डावीकडचा राजमाचीकडे. आम्ही डावीकडून निघालो. काही वेळातच एक ओढा ओलांडून व तीव्र चढ चढून आम्ही गावाच्या वेशीवर पोहोचलो व काही वेळातच गावाच्या अलीकडे असलेल्या एका खोपीपाशी पोहोचलो. किल्ल्याचा कडा आता अगदी शेजारीच उभा होता. हा सबंध प्रवास १८ किमीचा असून ४ ते ५ तास लागतात.


राजमाची हा किल्ला सातवाहनकालीन कारण हा प्राचीन काळचा बोरघाटाचा मार्ग व आजुबाजूला बर्‍याच लेण्या. त्यावर लक्ष्य ठेवायला बलदंड किल्ला हवाच. खुद्द किल्ल्यावरही व आजुबाजूला बरीच सातवाहनकालीन टाकी आहेत.
खोपीत थोडी विश्रांती घेतली व थोड्या वेळातच फटफटले. आता जवळूनच बिबट्यांचे हूंकार ऐकू आले. पण भीती अशी वाटली नाही. ताजेतवाने होउन आम्ही श्रीवर्धन बालेकिल्ला पाहण्यास निघालो. व दोन बालेकिल्ल्यांच्या मध्ये असलेल्या भैरवनाथाच्या देवळापाशी आलो. तिथे काही मर्कट्लीला पाहिल्या.


दोघे जण मंदिरातच बसले व आम्ही दोघे किल्ला पाहण्यास निघालो. १५ मिनिटातच आम्ही किल्ल्याच्या गोमुखी दुमजली प्रवेशद्वारापाशी आलो. तिथून उजवीकडच्या वाटेने आम्ही पश्चिम बुरुजापाशी आलो. तिथून अगदी समोर ढाकच्या बहिरीच्या रौद्र कातळकड्याचे व कळकराय सुळक्याचे दर्शन होत होते. शेजारीच मांजरसुंबा होता. व डावीकडे दूरवर ईर्शालगड, माथेरान व त्या पाठीमागे प्रबळगड व कलावंतीण ही दिसत होता.

आता आम्ही सर्वोच्च टोकाकडे निघालो होतो. काही वेळातच कड्याला लगटून असलेल्या थंडगार पाण्याच्या टाक्यातील पाणी पिवून व ४/५ कोरीव पायर्‍या आम्ही ध्वजकाठीपाशी आलो. आता चौफेर प्रचंड विस्तृत प्रदेश दिसत होता.लोणावळ्याहून येणार पुर्ण मार्ग व त्यामधील खोल दरी, पलीकडे ड्यूक्स नोज, पाठीमागे ढाक बहिरी ई. सर्व दिसत होते.


आता आम्ही पूर्व बाजुच्या चिलखती बुरुजापाशी निघालो. बुरुजात जायला एक कमानदार जिनाच खोदला आहे. बाहेर येताच अप्रतीम दृश्य दिसते.

हा नजारा डोळ्यांत साठवूनच तट्बंदीवरून जात जात खोदीव कोठारे पाहून आम्ही किल्ला उतरलो व देवराई मधून जात पठारावरील उदयसागर तलावाकडे गेलो. तलावाच्या काठी पुरातन कोरीव खांब असलेले शिवमंदीर आहे.


कैलासनाथाचे दर्शन घेउन आम्ही रामभाउंकडे मस्त तांदळाची भाकरी, पिठले, ठेचा यांचे जेवण केले व साधारण सव्वा वाजतो कोकणातील कोंदिवडे-कर्जत च्या बाजुने निघालो. वाटेत एक हुप्प्यांची जोडी पाहिली. काही वेळातच सह्याद्रीच्या मुख्य धारेपाशी आलो. इथून खूप खोलवर ३५०० फूट खाली कोकण दिसत होते. एका तीव्र उताराच्या अरूंद पायवाटेने निघालो. अनंत वळणे घेत, घसरत घसरत पाणी संपवत आम्ही उतरू लागलो.

कितीही उतरले तरीही पायथा अजून बराच खाली होता.शेवटी कसेबसे आम्ही कोंढाणा लेण्यांपाशी पोहोचलो. डिहायड्रेशन मुळे कुणीच त्यांचे सौंदर्य टीपू शकले नाही. तिथून तसेच खाली उतरत इमू फार्मपाशी आलो. तिथे पाणी मिळाले. १५/२० मिनिटे तिथेच दम काढून कोंढाणे गावात आलो. मनरंजन आता दिमाखात उंच उभा होता.

कोंढाणे गावातून सहा आसनीने खरवंडि, कोंदिवडे, अशी गावे पार करत कर्जतला पोहोचलो व प्रगतीने लोनावळा गाठले. व तिथून पिंपरी.

 https://www.misalpav.com/node/11227

 











 https://gadchitre.blogspot.com/2015/07/rajmachi-shrivardhan-fort-and.html

दोन बालेकिल्ल्यांचा राजमाची! |


राजमाची या किल्ल्याचा भौगोलिक विस्तार मोठा वैशिष्टय़पूर्ण आहे. कारण बहुतांशी किल्ल्यांना एकच बालेकिल्ला असतो. तिथे मात्र आपल्याला दोन बालेकिल्ले दिसतात. श्रीवर्धन आणि मनरंजन या नावाचे! हे बालेकिल्ले प्रथमदर्शनी पाहणा-याला दोन स्वतंत्र किल्लेच वाटतील.
RAJMACHI 6रायगड आणि पुणे जिल्हय़ांच्या सीमेवरून गेलेली सहय़ाद्रीची रांग ही नेहमीच सर्व प्रकारच्या भटक्यांना आकर्षित करत आली आहे. या रांगेदरम्यान कितीतरी निसर्गरम्य आणि डोळयांची पारणं फेडणारी ठिकाणं लपली आहेत. लोणावळा, खंडाळा ही ‘हॉट डेस्टिनेशन’ तर आहेतच, याशिवाय भाजे, कार्ला, बेडसे अशा एकापेक्षा एक सरस लेण्यादेखील यात सामावलेल्या आहेत.

दुर्गप्रेमींसाठी तर ही रांग म्हणजे एक प्रकारची भटकंतीची मेजवानीच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर, घनगड, ढाकचा बहिरी, कळकरायचा सुळका, नागफणी, तेलबैला अशी एकापेक्षा एक सरस नावं या दरम्यान आढळतील. या नावांतच आणखी एक भर पडली आहे ती ‘राजमाची’ या किल्ल्याची! नावाप्रमाणेच या किल्ल्याचं रूपही राजस आहे. त्यामुळे हे राजबिंड रूप डोळ्यांत साठवण्यासाठी आम्हीही चालू लागलो तिथली वाट..

तसं पाहिलं तर हा राजमाची अगदी शब्दश: दोन जिल्हय़ांच्या सीमेवरच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळेच मुंबई-पुणे असा ट्रेनने नेहमी प्रवास करणा-या प्रवाशांना याचं कधीतरी दर्शन झालेलंही असतं. खंडाळा बोगद्याच्या अलीकडे डावीकडे पाहिल्यास तटबंदीचा शेलापागोटे बांधलेला हा किल्ला ओळखणं अवघड नाही. नेमकी हीच गोष्ट अस्सल भटक्यांच्या नजरेतून सुटणं शक्य नाही. आमचीही सुटली नाही. अत्यंत दुर्गम जागा अन् अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत शेकडो मैल दूर असणा-या उधेवाडीत हा किल्ला वसलेला आहे. उधेवाडी हे गाव आहे पुणे जिल्हय़ातील मावळच्या पश्चिमेला. म्हणजेच लोणावळ्यापासून बारा-तेरा किलोमीटरवर. त्यामुळेच लगतच्या शहरी भागाकडून बरेच पर्यटक या किल्ल्यांवर वीकएंडचा मुहूर्त गाठून येत असतात.
पूर्वी या किल्ल्यावर येण्यासाठी लोणावळ्याहून तुंगार्लीमागे सहा-सात तासांची पायपीट करत यावं लागायचं. परंतु सध्या पावसाळा सोडला की जीप, दुचाकी आदी वाहनं कच्च्या रस्त्याने उधेवाडीपर्यंत येतात. अशामुळेच या किल्ल्यावर येणं हे अधिक सोयीस्कर झालं आहे. तसंच किल्लासुद्धा जास्त दमछाक करणारा नसल्यामुळे अगदी कुटुंब कबिल्यासहीत तिथे मुक्कामाला आले तरी इथे अतिशय उत्तम अशी राहण्याची, खाण्याची सोय होऊ शकते.

राजमाची या किल्ल्याचा भौगोलिक विस्तार मोठा वैशिष्टय़पूर्ण आहे. कारण बहुतांशी किल्ल्यांना एकच बालेकिल्ला असतो. तिथे मात्र आपल्याला दोन बालेकिल्ले दिसतात. श्रीवर्धन आणि मनरंजन या नावाचे! हे बालेकिल्ले पाहणा-याला दोन स्वतंत्र किल्लेच वाटतील. त्यामुळे आम्हीही हे भौगोलिक रूप पाहून चकीत झालो. गावक-याला विचारलं बालेकिल्ला तर समोर आहे, पण माची कुठाय? तो म्हणाला की, ‘‘ही उधेवाडी आणि तुम्ही वेस ओलांडून आत आलात तीच या गडाची माची’’! आता सर्द व्हायची वेळ आमची होती. खरोखरचं कुठल्याही किल्ल्याच्या भटकंतीत न दिसणारं रूप हे आम्हाला राजमाची भेटीत दिसलं आणि भावलंही.

उधेवाडीतून आम्ही वाट धरली ती या बालेकिल्ल्यांकडेच. या वाटेदरम्यान आम्हाला सुंदर पाण्याच्या टाक्या दिसल्या. ही पाण्याची टाकं म्हणजे उधेवाडीच्या ग्रामस्थांना वरदानच ठरली आहेत. या टाक्यांतील पाणी ऐन उन्हाळ्यातही ग्रामस्थांची तहान भागवतं. खरोखरच देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी र्वष लोटली; पण या गावाने विकासाची गंगा काही पाहिली नाही. वीज, डांबरी सडक तर सोडाच; पण साधं पाणीही या गावाला मिळू शकलं नाही. गडाच्या कुशीत राहणा-या या गावाला इतिहासानं मात्र कमी पडू दिलं नाही. या गावाला किल्ल्याचं पाणी तर मिळतंच; पण चरीतार्थही राजमाचीच्या पर्यटनावरच चालतो. इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी मंडळी तिथे गेली की हमखास मुक्काम ठोकतात. ही वाडीही तितकीच आपुलकीने राहण्याची, जेवणाची अल्पदरात सोय करतं. तिथलं वातावरण आणि आदरातिथ्यं पाहून पहिल्या दुर्गसाहित्य संमेलनाचा मानही याच किल्ल्याला मिळाला.

एव्हाना आम्ही दोन्ही बालेकिल्ल्यांच्या खिंडीत आलो होतो. तिथे अतिशय सुंदर असं भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिरासमोरच तीन दीपमाळा व काही भग्नावशेष दिसतात. या मंदिराच्या पुढून वाट जाते ती श्रीवर्धन या बालेकिल्ल्यावर. हा बालेकिल्ला मनरंजनपेक्षा काहीसा उंच आहे. म्हणूनच यावर आम्ही मोर्चा वळवला. साधारण पाऊण तासातच पाय-यांनी आणि उद्ध्वस्त दरवाजातून माथ्यावर आलो. तिथे उरले आहेत ते इमारतींचे केवळ अवशेषच! बाकी तटबंदी आणि बुरूज हे आजही ब-या अवस्थेत तग धरून आहेत. श्रीवर्धनच्या दक्षिणेकडील बुरूजावर उभं राहिल्यानंतरचा देखावा खरं तर काय वर्णावा! समोर नजर जाईल तिथंपर्यंत पसरलेली प्रचंड खोल दरी.. या दरीच्या वर दोन्ही बाजूने सहय़ाद्रीचे तुटलेले कडे.. हे सारं काही आमच्या सौंदर्याच्या मापदंडाबाहेरचंच होतं. त्यामुळेच निसर्गाचं खोलवर चिरत गेलेलं रूप हे मनाच्या खोलीत अजूनही घर करून बसलंय. श्रीवर्धनच्या तटातटाने फिरून आम्ही पुन्हा खाली खिंडीपाशी आलो आणि मंदिराच्या मागून रस्ता धरला तो थेट मनरंजनवर!

मनंरजन हा काहीसा छोटा बालेकिल्ला आहे. यावर काही वाडय़ांचे चौथरे, पाण्याची टाकी दिसते. तिथला दारूगोळा कोठाराची इमारत ब-यापैकी शाबूत आहे. तिथून खाली कोकणचं दृश्य मोठं विलोभनीय दिसतं. पश्चिमेकडील डोंगराच्या पोटातून जर पुणे-मुंबई अशी रेल्वेगाडी दिसली तर तो आपल्या भटकंतीचा मोठा गमतीचा क्षण ठरतो.

राजमाची या दुर्गाची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी, असं सांगण्यात येतं. या विधानाला आधार घेतला जातो तो या किल्ल्याच्याच पोटात असणा-या कोंडाणे लेण्यांचा. कारण या अतिप्राचीन लेण्या या राजमाचीच्या राजाश्रयाशिवाय निर्मिल्या जाणे हे शक्यच नव्हतं. म्हणूनच हा संदर्भ बरोबर ठरतो. सातवाहनांपासून चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, बहीमानी सत्तेपासून ते मराठेशाहीपर्यंतची सारी सत्तांतरं या किल्ल्याने अनुभवली. शिवकाळात या गडाचा उपयोग घाटमार्गावर टेहळणीसाठी करण्यात आला.

राजमाचीचा संपूर्ण परिसर पाहायला एक दिवस पुरतो. सकाळी सुरुवात केली की संपूर्ण किल्ला पाहताना कधी संध्याकाळ होते ते कळतदेखील नाही. दिवस कलायला लागला की तिथला निसर्गही आपले रंग बदलतो. हे बदलणारं रूप मोहक वाटायला लागतं. निसर्गाचं हे सांजरूप आपल्या मनात कुठंतरी खोलवर घर करून बसतं. मग आपसुकच एखादा मुक्काम तिथे पडतो.. आणि मग काय अनोख्या सहय़स्पर्शाने मंतरलेली ही रात्रंसुद्धा सरूच नये असं वाटत राहतं..

कसे जाल राजमाची किल्ल्यावर)


राजमाची हा किल्ला लोणावळ्या जवळच आहे. उधेवाडी हे पायथ्याच गाव आहे. तुंगार्ली मार्गे आपल्याला राजमाची ला जाता येत. पुण्याहून आपण लोकल ने लोणावळ्या पर्यंत पोहचलो कि उतरल्या नंतर आपल्या उजव्या बाजूने रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाडाव. आणि तुंगार्ली ला कसे जायचं अस स्थानिकांना विचारव ते आपल्याला नीट सांगतात. अथवा आपण तिथून मेन रोड पर्यंत जाव आणि तिथेच एक भारत पेट्रोलियम चा एक पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजरून्च हि वाट जाते. ही वाट थेट राजमाची च्या पायथ्या पर्यंत जाते. किमान ३ ते ४ तास सलग आपल्याला चालावे लागते कारण लोणावळा ते उधेवाडी हे अन्तर किमान १६ किलोमीटर अंतर आहे. उधेवाडी गावामध्ये जास्तीत जास्त २०-२२ घर असतील. गावात खायची व राहायची उत्तम सोय होते. राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाक चा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्टया एक प्रमुख ठाणं असले पाहिजे. किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत. हे दोन बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र असे किल्लेच होय.

तसा मी राजमाची ला ३ वेळा जाऊन आलेलो आहे. पण १८/३/२०१७ ला रात्री साधारण ११:३० ला ठरल उद्या राजमाची ला जायचं म्हणून ठरल तेव्हा आम्ही ३ जण होतो मी, शुभम आणि सचिन. पण अचानक काही कारणामुळे सचिन ला जमल नाही दुसऱ्या दिवशी. मला अस वाटत होत कि सकाळी लवकर निघावं म्हणजे जास्त उन होणार नाही पण शुभम ची दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यामुळे आम्हाला उशिरा निघावं लागणार होत आणि मला मनातल्या मनात वाटत होत कि आता आपल्याला उन्हामुळे खूप त्रास होणार वगरे वगरे. पण शुभम त्याची परीक्षा संपून सकाळी ८:५० ला साधारण घरी आला. मी त्याला म्हंटल अरे चाल लगेच निघू कारण ९:०५ ला लोकल होती तो हो म्हंटला फक्त घरी जाऊन ब्याग ठेऊ आणि निघू. मी पण ठीक आहे म्हंटल पण आता खूप थोडा वेळ उरला होता म त्याला म्हंटल जाता जाता आकाश ला माझ्या घरी पाठव म्हणजे तो माझ्याकडे येईस्तोवर तू काहीतरी खाऊन घे म निघू. आणि त्यानी सांगितल्याप्रमाणे केल सुद्धा म आकाश आला आणि आम्ही शुभम कडे पोहचलो पण तोवर वेळ निघून गेली होती. लगेच पुढची गाडी कधी आहे ते पहिले तर पुढची गाडी सकाळी ९:५५ ला होती. आता तसा थोडा वेळ होता. मग काय शुभम ने सावकाश नाश्ता केला आणि मी पण थोडी त्याला मदत केली. आणि लगेच निघालो. आम्ही पुणे स्टेशन ला पोहचलो तोवर गाडी चा फलाट क्रमांक निश्चित झाला होता. लगेच तिकीट काढाल आणि गाडीची वाट पाहू लागलो. थोड्याच वेळात गाडी आली आम्ही गाडीत बसलो. आणि तिच्या वेळेत ती निघाली.

साधारण आम्ही ११:२० ला लोणावळ्यात पोहचलो. तिथे १० मि. थांबलो आणि तुंगार्ली च्या दिशेने चालायला सुरवात केली. गप्पा मारत मारत आम्ही चालत होतो. उन होत कडक पण आमचा उत्चाह जास्त असल्या मुळे आम्हाला जाणवत नव्हत. साधारण १२:०० वाजता आम्ही तुंगार्ली गाव सोडल आणि पुढे राजमाची च्या दिशेने पाउल टाकत होतो. आता साधारण १:०० वाजत होता तेवढ्यात मागून एक ट्रक आला त्यांना विचारल सोडणार का ते म्हंटले मी शेवट पर्यंत नाहीये मला अलीकडेच थांबायचं आहे. आम्ही चालेले म्हंटल आणि ट्रक मध्ये चढलो. साधारण एक २० मि. झाल्यावर काकांनी गाडी थांबवली. म आम्ही उतरलो आणि परत चालायला सुरवात केली. थोड पुढ गेलो आणि बसलो. लोणावळ्यात आम्ही केळी घेतली होती २-२ खाली आणि परत पुढे निघालो. आता १:३० वाजले होते.

तरी अजून अर्धा तास पायपीट केल्यावर मागून एक चार चाकी येताना दिसली आम्ही थांबलो त्यांना काही वेगळाच वाटल असाव आम्हाला पाहताच त्यांनी गाडी हळू केली. आम्हाला वाटल हे काही आपल्याला लिफ्ट देणार नाहीत म आम्ही लक्ष ण देता परत चालायला सुरवातीला पण लगेचच ते पुढे आले आणि आमच्या बाजूला गाडी थांबवली. आम्हाला त्यांनी विचारला गावात चाललात ना?? आम्ही हो म्हणटलो आणि म त्यांच्या परवानगी ने गाडी मध्ये बसलो. आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला ते आमची विचारपूस करत होते त्या वरून अस लक्षात आल कि त्यांना अस वाटल कि आम्ही गावकरीच आहोत. म आम्ही त्यांचा गैरसमज दूर केला. आणि आता आम्ही तो गाडीतला सुखाचा प्रवास चालू झाला. बोलता बोलता हे लक्षात आल कि यांचा पूर्ण ग्रुप आलाय म्हणजे १ नाही २ नाही चक्क ४५ टाटा सफारी चा ताफा च होता. हा अनुभव आम्हाला नवीनच होता.

दुपारी साधारण २:१० वाजता आम्ही गावात पोहचलो. मग आम्ही वेग वेगळे झालो. आधी गावातल्या तलावा पाशी जाऊन आम्ही फ्रेश झालो.

आणि आता किल्ला पाहण्यास निघालो. त्या आधी काहीतरी खाव असा विचार केला. आणि म गावात एकानं विचारल तर त्यांचा जवळ जवळ सगळा स्वयंपाक संपला होता. मग काय त्यांनी विचारल म्यागी चालेल का?? मग काय दोघेही हो म्हणटलो बुडत्याला काडी चा आधार.

म्यागी खाऊन आम्ही किल्ला पाहायला निघालो. जाण्याच्या मार्गावर खूप सुधारणा केल्या आहेत. परिसराचा आढावा घेत आम्ही भैरोबाच्या मंदिरा पर्यंत पोहचलो.

हे पाहून आता आम्ही परततच होतो इतक्यात माझ्या आणि शुभम मध्ये चर्च्या चालू होती कि मनरंजन किल्ल्याच्या मध्यवर्ती एक टाक आहे म्हणून. तो म्हंटला आपण हे पाहूनच जायचं म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो पण ते आम्हाला काही लवकर सापडेना. म तिथून आम्ही श्रीवर्धन, ढाक आणि नागफणी चे दृश्य डोळ्यात साठवत होतो.

इतक्यात शुभम च लक्ष्य खाली वाटेकडे गेले आणि तो म्हंटला अरे त्या गाड्या निघाल्या आम्ही तसेच पळत थेट त्या गावाच्या वेशी पर्यंत पोहचलो. आणि आम्ही पाहतच होतो ज्या काकांनी आम्हाला येताना लिफ्ट दिली होती ते दिसत आहेत का, पण इतक्यात एका गाडीचा हॉर्न वाजला आणि आम्ही तिकडे पाहिलं तर तेच काका होते. म आम्ही परत त्यांची परवानगी घेऊन गाडी मध्ये बसलो. आणि आमचा राजमाची चा खडतर प्रवास आरम्दाई प्रवासा मध्ये रूपन्तरित झाला. काकांनी गाडी मध्ये मस्त गाणी लावली होती. त्यांची परवानगी घेऊन थोडे त्या राईड चे फोटो काढले.

त्या काकांनी आम्हाला इतकी मोठी लिफ्ट दिली कि थेट पुण्या मधेचे आणून सोडल म्हणजे त्यांना पण पुण्यातच येयच होत. आत्तापर्यंत पहिल्यांदा इतका सुखाचा ट्रेक अनुभवायला मिळाला.

अंदाजे जायचा खर्च एकाचा :
पुणे ते लोणावळा १५/-
एकूण खर्च १५/-

परतीचा एकाचा खर्च :
लोणावळा ते पुणे १५/-
एकूण खर्च १५/-

***काही महत्वाच्या गोष्टी ***
किल्ला चढाई ला अवघड नसला तरी चालण्या साठी खूप अन्तर आहे म्हणजे १६ किलोमीटर.
ज्याला चालण्याची सवय नाही त्यांनी इथे येऊ नये कारण इथे दुसरा पर्यायच नाहीये.
उन्हाळ्यात पूर्ण रस्त्यात पाणी नसते.
राहण्याची व भोजनाची उत्तम सोय गावात होऊ शकते.
शक्यतो जुन ते जानेवारी पर्यंत आपण ह्या किल्ल्यावर भेट देऊ शकतो.
उन्हाळ्यात जाणार असाल तर रात्रीच जाणे करावे.
पावसाळ्यात इथे प्रचंड पाऊस असतो. काही ठिकाणी आपला पाय गुढग्या इतक्या चिखलात जाऊ शकतो.
योग्य वेळीस इथे आलात तर आपल्याला खूप प्रमाणात करवंद खाण्यास मिळतील.

 http://agnihotrisaurabh123.blogspot.com/2017/03/how-to-reach-rajmachi-fort-from-pune.html

राजमाची किल्ला

लोणावळ्यापासून १५ किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला उधेवाडी हे गाव आहे. ह्याच गावातुन गडाच्या दोन्ही बाले किल्ल्यावर जाण्यास वाट आहे. मनरंजन आणि श्रीवर्धन हे दोन किल्ले वसलेले आहेत. कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे. या बंदरापासून बोरघाटामार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग. जसा नाणेघाट तसा बोरघाट, त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ले राजमाची.

इतिहास : 
राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणाचा दरवाजा’संबोधण्यात येत असे. कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटवरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते. यानंतर १७१३ मध्ये शाहुमहाराजांनी कान्होजी आंग्रे यांना हा किल्ला दिला. सन १७३० मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला. १७७६ मध्ये सदाशिवराव तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटा पर्यंत पोहचला त्याने राजमाची किल्ला घेतला. यानंतर या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजुबाजुचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. पुढे १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला.

राजमाची ट्रेक:
गडकिल्ले भ्रमंती ह्या ग्रुपसोबत हि माझी तिसरी ट्रेक. निसर्गाची ओढ तर सर्वानाच खेचते पण त्यालाच जोड जेव्हा ट्रेकिंगची लागते तेव्हा डोंगर दऱ्या-खोऱ्यात फिरायचे जणू वेडच लागते. राजमाची ट्रेक म्हणजे खरोखरच एक अविस्मरणीय अशी ट्रेक होती.
राजमाची किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी लोणावळ्याहून उधेवाडी गावापर्यंत जीप ने प्रवास करता येतो. आम्ही सर्वजण लोणावळा स्टेशनला भेटलो आणि तिथून पुढे जीप ने निघालो परंतु कच्चा रस्ता असल्यामुळे पुढचा २ तासाचा प्रवास पायीच करावा लागला. उंच डोंगर, खोल दरी, झरे, हिरवळीच्या चादरीवर पसरलेली धुक्याची झालर, थंड हवेत डुलणारी रानफुले, त्यांच्यासोबत बागडणारी फुलपाखरे, तर कुठे बैलांची झुंज...हे सर्व नयनरम्य देखावे पाहून आम्ही थक्कच झालो. कुठे कुठे उन्हाची झळही बसत होती.
काही अंतर चालल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. त्यापैकी उजव्या बाजुचा रस्ता वरंवंड कडे तर डाव्याबाजुचा रस्ता उधेवाडी कडे जातो. येथे दोन बरेच जुने व गंजलेले बोर्ड आहेत त्यावर फक्त उधेवाडी व वरवंड लिहिलेले आढळते. येथुन पुढे काही अंतर चालल्यावर आपण राजमाचीच्या वेशीवर येऊन पोहचतो.
वेशीजवळ अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, एक वीरगळ, गणेश व मारुतीचे मंदिर बघायला मिळते. वाटेत ओळदरा पॉईंट लागतो. इथे एक मोठा ओढा आहे. थोडा वेळ तिथे थांबून फोटो काढण्याचा मोह आवरू शकलो नाही. तिथेच काही गावकरी मुले खेकडेही पकडत होती. सोबत प्रशांत दादा आणि प्रसाद दादा त्यांचे अनुभव हि सांगत होते. २ तास चालल्या नंतर आम्ही उधेवाडी गावात पोहचलो. इथेच गावातल्या घरांमध्ये राहण्याची - खाण्यापिण्याची सोयही होते. गरम गरम चहा पिऊन आम्ही मनरंजन किल्ल्याच्या दिशेने निघालो .
PC : Prashant Mahimkar
श्रीवर्धन वरुन दिसणारा मनरंजनगड
मनरंजन किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी आहे. प्रवेशद्वारा तुन वर गेल्यावर डाव्या हाताला आपण एका बुरुजावर पोहोचतो. येथुन वर गेल्यावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत. टाक्यावरुन पुढे गडमाथ्यावर /किल्ल्याच्या उजवीकडच्या वाटेवर जुन्याकाळातील किल्लेदाराच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. हे बहुदा एखादे धान्य कोठार असावे असे वाटते. तेथील प्रवेशद्वाराच्या चौकटीवर कोरलेल्या गजाननाचे व कमळाच एक शिल्प पहावयास मिळतं. ह्या वाडयावरुन पुढे जाताच थोडया खालच्या बाजुला आपणास आणखी दोन आकाराने मोठी पाण्याची टाकी पाहावयास मिळतात. ह्यापैर्की एका टाक्यात उतरण्यासाठी दगडी पाय-या अस्तीतत्वात आहेत तर दुस-या टाक्यातील पाणी वाहुन जाऊ नये म्हणुन चांगलं ३ फुट रुंदीचे दगडी बांधकाम पहावयास मिळते. तसेच एका टाकी शेजारी वीरगळ आणि शिवलिंग आहे. प्रशांत दादांनी आम्हाला ह्या किल्ल्याविषयी, इथल्या ऐतिहासिक वास्तूविषयी तसेच पाण्याच्या टाक्यांची रचना, शिल्प, वीरगळ इत्यादि विषयी महत्वपूर्ण अशी माहितीही दिली. मनरंजन किल्ल्याचा प्रवास संपवून आम्ही पुढे श्रीवर्धनला निघालो.
मनरंजन आणि श्रीवर्धन ह्या दोन्ही बालेकिल्ल्यांच्या मध्ये जो सखल असा भाग आहे, तेथे भैरवनाथाचे देवालय आहे. तेथील मंदिर परिसरात तोफे, गजलक्ष्मी, वीरगळ, दीपमाळ, समाधी असे काही अवशेष आढळतात. त्याविषयी बरीचशी माहिती प्रशांत सरानी दिली. श्रीवर्धनच्या पायथ्याला छोटी टपरी आहे तिथे थोडा वेळ अराम केला, लिंबू सरबत पिऊन आम्ही थेट श्रीवर्धन गड गाठला.

वीरगळ
श्रीवर्धन किल्ला मोठा आहे कदाचित संरक्षणासाठी त्याला बुलंद अशी दुहेरी तटबंदी बांधलेली आहे. गडावर पिण्याच्या पाण्याचे टाके आणि ३ मोठ्या खोल्या असलेली गुफा पण आहे. ह्या टाक्यांपैकी एका टाक्याजवळ लहानशी तोफ पडलेली आढळते. थोडस वर पोहचताच समोरच दुहेरी तटबंदी असणारा बुरुज नजरेस येतो. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर ध्वजस्तंभ आहे आणि समोरच ढाकबहिरीणीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हाताला नयनरम्य तलाव व संपूर्ण परिसर दिसतो. योगायोगाने आणि नशिबाने मला इथून इंद्रवज्र पाहण्याचे भाग्य लाभले.



PC: Prshant Mahimkar
श्रीवर्धनगडावरील गुंफा सातवाहन काळ


संपूर्ण किल्ला पाहून आम्हाला उतरायला सायंकाळचे ५ वाजले होते. गावातच असलेल्या घरात आमची जेवणाची सोय झाली होती तिथेच जेऊन आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली आणि जसजसा अंधार पडू लागला आम्ही उदयसागर तलावाच्या दिशेने निघालो . गावातून तलावावर उतरायला दगडी पायऱ्या बनवल्या आहेत. अंधारातून वाट काढत तलावर पोहचण्याचा आनंद तर होता पण हा अनुभव रोमहर्षक आणि चित्त थरारक असाही होता.
तलावाच्या शेजारीच पुरातन शिवमंदिर आहे. मंदिरासमोरच नंदी, एक दीपमाळ तसेच गोमुख असून त्यातले पाणी समोरच्या कुंडात पडते. रात्रीच्या अंधारात मंदिरआतील शिल्पे पाहने म्हणजे खरोखरच थरारक असा अनुभव होता . त्या मंदिराची ऐतिहासिक माहिती प्रशांत सरांनी दिली. पाऊस पडत असल्यामुळे आम्हाला बराच वेळ मंदिरातच घालवावा लागला आणि त्यामुळे प्रशांत आणि प्रसाद दादांकडून बरीचशी माहितीहि मिळाली.
PC: Pallavi Dhoke
शिवमंदिराची स्थापना , ऐतिहासिक शिल्पे व इतिहासाची माहिती सांगताना प्रशांत सर


PC: Pallavi Dhoke
उदयसागर तलावा शेजारी असलेलं हे पुरातन शिव मंदिर
आम्ही तिथून गावात परतलो ते खूप साऱ्या आठवणी घेऊन. गावातल्या घरातच रात्रीच जेवण आटोपून आम्ही रात्रीच्या शीतल शांत अश्या वातावरणात थोडासा फेरफटका हि मारला.. खूप गप्पागोष्टी मारल्या काही भुताच्या तर काही ऐतिहासिक आणि बराचसा हास्यविनोद करून सर्वजण थकल्यामुळे गाढ झोपी गेलो.

 https://gadkillebhramti.blogspot.com/2018/01/blog-post31Rajmachifort.html

 

राजमाची

आजकाल कुणी नातेवाईक भेटले कि पहिला प्रश्न हाच असतो की कुठं फिरायला गेला होता आणि आता कुठं जाणार आहेस.हे शब्द ऐकले कि  खुमखुमी येते.आताच निघावं किल्ल्यावर असा वाटून जात.आता व्हाट्स अँप असल्यामुळं स्टेटस ठेवायची चोरी कि पोर बूट घालून तयार होतात. यंदा कुठं जावं यावर बराच खल झाला (माझा मीच) आणि अचानक ट्यूब पेटली.इतक्या वेळा कोकणात उतरताना दिमाखात उभा असलेला राजमाची दर वेळी यायचा निरोप  देतो  आणि मी विसरून जातो.

जसा विशाळगड ऐन माथा आणि कोकण याच्या मध्ये उभा आहे तसाच राजमाची सुद्धा खंडाळा आणि खोपोली,कर्जत च्या मध्ये उभा आहे.






पुण्य

 https://sahyadarshan.blogspot.com/2019/03/rajmachi.html

 https://indiafirst2017.wordpress.com/2017/01/19/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/

 

 संदर्भ – प्र.के.घाणेकर, साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची, स्नेहल प्रकाशन, पुणे)





















































































































































अलविदा!









































































No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...