Saturday, March 2, 2024

काही पौराणिक कथा

 

*शुकमुनी - रंभा संवाद*

शुकमुनी हे महर्षी वेद व्यास यांचे पुत्र होते. ते गर्भताच असतांना त्यांना मोह माया याचे ज्ञान झाल्याने जन्मच घेत नव्हते. बारा वर्षे आईच्या गर्भात राहीले .भगवान श्रीकृष्ण यांनी तुला जन्मतः च वैराग्य प्राप्त होईल, असा वर दिला. त्यामुळे शुकमुनी यांनी जन्मतःच वैराग्य धारण केलेले होते. गर्भातच त्यांनी वेद, उपनिषदे, शास्त्र, पुराण यांचे इतंभुत ज्ञान प्राप्त केले होते. गर्भातच ते ब्रह्मलीन झाले होते

एकदा अतिसुंदर, कमनीय बांधा, भरीव उरोज अशा रंभा नावाच्या अप्सरेला शुक मुनींची तारुण्याने रसरसलेली शरीरयष्टी बघुन कामवासना जागृत झाली. तिला शुकमुनी बद्दल आसक्ती निर्माण झाली. तिने सरळ सरळ माझी कामवासना तृप्त करा अशी मागणी शुकमुनिकडे केली. तिच्या बोलण्याकडे शुक मुनींनी लक्ष दिले नाही. शुकमुनी म्हणाले, तु ज्याबद्दल मला विचारत आहे, त्या गोष्टीचा अनुभव नसला तरी ते एक क्षणिक सुख आहे, आणि त्यानेच मनुष्याचे जीवन दुःखद होते आणि पुढे त्यातुन निरर्थक जीवनाची सुरवात होते.

चित्रस्रोत : फेसबुक

तिने मनात विचार केला, आपल्या मधुर आणि शृंगारीक मोहक संवादातुन शुक मुनींची कामवासना सहज जागृत करू. त्यामुळे ती आपल्या सौंदर्याचे वर्णन करू लागली. माझ्या अंगातून सुगंधी सुवसांच्या लहरी बाहेर पडतात. त्यावेळेस शुकमुनींनी सांगितले, स्त्रीच्या शरीरात असे काही गुण असतात असे मी प्रथमच ऐकत आहे. तु जर एवढी सुंदर आहे तर पुढील जन्मात मी तुझ्या गर्भातून जन्म घेऊन माझे प्रभुकार्य पार पाडील.

एवढे सांगुन पण रंभाची कामवासना मात्र कमी होईना. तिने शुकमुनींचे मन विचलित करण्यासाठी स्त्री देहाच्या प्रत्येक इंद्रियाचा अंत्यत शृंगारीक आणि कामुक वर्णन केले आहे. पण शेवटी तिच्या मनात तिरस्कार निर्माण होतो.

चित्रस्रोत : गुगल

शुकमुनीं - रंभा हा संवाद शृंगार आणि आध्यात्मिक, भोग आणि मोक्ष, संसारीक स्थूलता आणि पारमार्थिक सुक्ष्मता याबद्दल खुप सविस्तर विश्लेषण करतो. शुकमुनींनी रंभेचा प्रत्येक शृंगारीक मुद्दा हा आध्यात्मिक मुद्द्याने खोडून काढला आहे. त्यालाच शुकमुनी आणि रंभा संवाद म्हणतात. या संवादाचे रचियाता कोण आहे, हे अनभिज्ञ आहे.

या संवादात ३९ श्लोक आहे. रंभेच्या प्रत्येक शृंगारीक प्रश्नाला शुकमुनी यांनी आध्यात्मिक आणि पारमार्थिक उत्तर दिले आहे.

शुकमुनी - रंभा संवाद :

रम्भा :

मार्गे मार्गे नूतनं चूतखण्डं खण्डे खण्डे कोकिलानां विराब: ।

रावे रावे मानिनीमानभड्गॊ भड्गे भड्गे मन्मथ: पञ्चबाण: ॥१॥

अहो मुनीवर मार्गा-मार्गा वर नवीन आंब्याची/ मंजरी (मोहरलेली) झाडे शोभून दिसत आहेत. प्रत्येक झाडावर कोकिळा सुमधुर कूजन करित आहेत. हे कूजन ऎकून मानी स्त्रियांचे गर्वहरण होत आहे आणि गर्व नष्ट होताच पाच बाणांना धारण करणारा कामदेव मनाला बेचैन करित आहे.

शुक :

मार्गे मार्गे जायते साधुसड्ग सड्गे सड्गे श्रूयते कृष्णकीर्ति: ।

कीर्तो कीर्तो नस् तदाकारवृत्ति: वृत्तो वृत्तो सच्चिदानंदभास: ॥२॥

तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रम्हवृन्दं वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवाद: ।

वादे वादे जायते तत्त्वबोध: बोधे बोधे भासते चन्द्रचूड: ॥३॥

हे रंभे,

मार्गा-मार्गा वर मला साधुंचा सहवास लाभत आहे. प्रत्येक सहवासात भगवान कृष्णाचे गुणगान ऎकावयास मिळत आहे. ते ऐकत असताना आमची चित्तवृत्ति भगवंतात लीन होत आहे आणि ह्या ध्यानात सच्चिदानंदाचा सहवास लाभत आहे.

तसेच प्रत्येक तीर्थावर साधु संतांचा समुदाय उपस्थित आहे. हा समुदाय परमतत्त्वाविषयी विचार करित आहे. ह्या चर्चेतून आम्हाला तत्त्वाचा बोध होत आहे आणि ह्या बोधामधून भगवान शंकराचा सहवास लाभत आहे.

रम्भा :

गेहे गेहे जड्गमा हेमवल्ली वल्यां वल्यां पार्वणं चन्द्रबिंबम्‌ ।

बिम्बे बिम्बे दृश्यते मीनयुग्मं युग्मे युग्मे पञचबाणप्रचार: ॥४॥

घराघरामध्ये जणूकाही सुवर्णवेलीसारख्या चालत्या फिरत्या युवती आहेत. ह्या युवतींचे मुख पोर्णिमेच्या चंद्राप्रमाणे सुंदर आहे. ह्या मुखचंद्रावर नयनरूपी दोन मत्स्य दिसत आहेत आणि ह्या डोळ्यांमध्ये कामदेवाचा संचार चालू आहे.

शुक :

स्थाने स्थाने दृश्यते रत्नवेदी वेद्यां वेद्यां सिध्दगन्धर्वगोष्ठी ।

गोष्ठ्यां गोष्ठ्यां किन्नरद्वन्द्वगीतं गीते गीते गीयते रामचन्द्र: ॥५।।

प्रत्येक ठिकाणी रत्नजडित यज्ञकुण्ड दिसत आहेत. प्रत्येक यज्ञकुण्डावर सिद्ध आणि गन्धर्वांची सभा भरली आहे. या सभेत किन्नरगण किन्नरींसमवेत गीत गात आहेत आणि प्रत्येक गीतात भगवान रामचंद्राचे गुणगान करीत आहेत.

रम्भा :

पीनस्तनी चन्दनचर्चिताड्गी विलोलनेत्री तरूणी सुशीला ।

नालिड्गिता प्रेमभरेण येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥६॥

भरदार उरोज असलेल्या, शरीरावर चंदनाचा लेप असलेल्या, चंचल नेत्र असलेल्या अशा सुंदर स्त्रिला ज्याने प्रेमयुक्त अलिंगन दिले नाही त्याचे जीवनच व्यर्थ आहे.

शुक :

अचिन्त्यरूपो भगवान्निरञजनो विश्वम्भरो ज्ञानमयश्चिदात्मा ।

विशोतिधो येन हदि क्षणं नो वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥७॥

ज्याच्या रूपाचे चिंतन होऊ शकत नाही, जो निरंजन, विश्वाचे रक्षण करणारा आहे; अशा ज्ञानाने परिपूर्ण चित्स्वरूप परब्रम्हाचे ज्याने हदयापासून स्मरण केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले आहे.

रम्भा :

कामातुरा पूर्णशशाड्वक्त्रा बिम्बाधरा कोमलनालगौरा ।

नान्दोलिता स्वे हदये भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥८॥

भोगाच्या इच्छेने व्याकुळ, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या, कोमल ओठ असणाऱ्या आणि कोमल कमळाच्या नाळाप्रमाणे गौर वर्ण असणाऱ्या कामिनीला ज्याने आपल्या बाहुपाशांद्वारे हदयाशी कवटाळून तिच्या शरीराचा भोग घेतला नाही तर त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

चतुर्भुजश्चक्रधरो गदाययुध: पीताम्बर: कौस्तुभमालया लसन् ।

ध्यात धृतो येन न बोधकाले वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥९॥

चक्रगदायुक्त चार हात असणाऱ्या, पीतांबर नेसलेल्या, कौस्तुभमणियुक्त माळेने शोभून दिसणाऱ्या भगवंताचे ज्याने जागृतावस्थेत ध्यान केले नाही, त्याचे चरणावर नतमस्तक झाला नाही त्याचे जीवन व्यर्थ गेले.

रम्भा :

विचित्रवेषा नवयौवनाढ्या लवड्गकर्पूर सुवासिदेहा ।

नालिंगिता येन दृढं भुजाभ्यां वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१०॥

विविध वस्त्र आणि अलंकारांनी युक्त, लवंग-कापूरादि द्वारे सुगंधित शरीर असलेल्या नवयुवतीला ज्याने घट्ट आलिंगन दिले नाही, तर तो पुरुषच नाही म्हणून त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

नारायण: पड्कजलोचन: प्रभु केयूरवान् कुण्डलमण्डितानन: ।

भक्त्या स्तुतो येन समाधितो नो वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥११॥

कमळासारखे नेत्र असलेल्या, कुरळे केस , कुंडलांनी सुशोभित मुख असणाऱ्या, जगाचा स्वामी असलेल्या भगवंताची ज्याने विशुद्ध मनाने स्तुती केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ गेले.

रम्भा :

प्रियम्वदा चम्पकहेमवर्णा हारावलीमण्डितनाभिदेशा ।

सम्भोगशाली रमिता न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१२॥

मधुर बोलणाऱ्या, चम्पक आणि सोन्याप्रमाणे वर्ण असणाऱ्या, हाराचा झुमका जिच्या बेंबीवर लटकत आहे आणि स्वतः हुन भोगाची इच्छा व्यक्त करणाऱ्या स्त्रीचा ज्याने उपभोग घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

श्रीवत्सलक्ष्माड्कितहत्प्रदेश: तार्क्ष्यध्वजा शाडर्गधर: परात्मा ।

न सेवितो येन नृजन्मनाऽपि वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१३॥

ज्याने मनुष्यजन्मात देखिल भृगुलतेने विभूषित हदय असलेल्या, ज्याच्या पंजात गरुड आहे अशा आणि शारंग धनुष्य धारण केलेल्या परमात्म्याची सेवा केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

चलत्कटी नूपुरमञ्जुघोषा नासाग्रमुक्ता नयनभिरामा ।

न सेविता येन भुजंगवेणी वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१४॥

नाजूक कमर असलेल्या, नुपूरांद्वारे मंजुळ घोष करणाऱ्या, नाकात मोती जडवणाऱ्या, सुंदर नेत्र असणाऱ्या आणि सर्पाप्रमाणे अंबाडा धारण केलेल्या सुंदरी, स्वतः हुन भोगासाठी तयार असतांना ज्याने त्याचा आस्वाद घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

विश्वम्भरो ज्ञानमयः परेशो जगन्मयोऽनन्तगुणप्रकाशी ।

आराधितो नाऽपि धृतो न योगे वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१५॥

विश्व चालवणाऱ्या, ज्ञानपूर्ण, परमात्मा, संसार स्वरूप, अनंत गुणांना प्रकट करणाऱ्या, त्रैलोक्याचे सुख देणाऱ्या भगवंताची ज्याने आराधना केली नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

ताम्बूलरागैः कुसुमप्रकर्षै सुगन्धितैलेन च वासितायाः ।

न मर्दितो येन कुचौ निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१६॥

सुगंधित पान, उत्तम फूल, सुगंधित तेल आणि अन्य पदार्थांनी सुवासित शरीर असलेल्या कामिनीचे उरोजस्थानाला ज्याने आपल्या मुठीत घेतले नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

ब्रम्हादिदेवोऽखिलविश्वदेवो मोक्षप्रदोऽतीतिगुणःप्रशान्तः ।

धृतो न योगे न हदि स्वकीये वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१७॥

ब्रह्म इत्यादिंचा देखिल देव, संपूर्ण जगाचा स्वामी, मोक्ष देणाऱ्या, निर्गुण, अत्यंत शांत भगवंताचे ज्याने योगाद्वारे ध्यान केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

कस्तूरिकाकुंकुमचन्दनैश्च सुचर्चिता याऽगुरूधूपिकाम्बरा ।

उरस्थले नो लुठिता निशायां वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१८॥

कस्तूरी आणि केशरयुक्त चंदनाचा लेप केलेल्या, चंदनगंधित वस्त्र नेसलेली स्त्री, ज्या पुरुषाच्या छातीला रात्रभर कधी स्पर्श झाला नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

आनन्द रूपो निजबोधरूपो दिव्यस्वरूपो बहुनामरूपः ।

तपः समाधौ कलितो न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥१९॥

आनन्दरूप, ज्ञानरूप, दिव्य शरीर धारण केलेल्या, ज्याची अनेक नावे आणि अनंत रुपे आहेत अशा भगवंताचे ज्याने समाधितही दर्शन घेतले नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

कठोरपीनस्तनभारनम्रा सुमध्यमा चंचलखंजनाक्षी ।

हेमन्तकाले रमिता न येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२०॥

हेमन्त ऋतूमध्ये कठीण आणि भरदार उरोजाने झुकलेल्या, पातळ कमर असलेल्या, चंचल आणि खञ्जन पक्ष्याप्रमाणे नेत्र असलेल्या स्त्रीचे ज्याने सेवन केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

तपोमयो ज्ञानमयो विजन्मा विद्यामयो योगमयः परात्मा ।

चित्ते धृतो नो तपसिस्थितेन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२१॥

तपोमय, ज्ञानमय, जन्मरहित, विद्यामय, योगमय अशा परमात्म्यामध्ये लीन होऊन ज्याने त्याला आपल्या चित्तामध्ये स्थिर केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

सुलक्षणा मानवती गुणाड्या प्रसन्नवक्रआ मृदुभाषिणी या ।

नो चुम्बिता येन सुनाभिदेशे वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२२॥

उत्तम लक्षणे आणि गुणांनी युक्त, प्रसन्न मुख असलेल्या, मधुरभाषी अशा सुंदरीच्या नाभिकमलाला ज्याने स्पर्श केला नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

प्रीत्याजितं सर्वसुखं विनश्वरं दुःखप्रदं कामिनिभोगसेवितम्‌ ।

एवं विदित्वा ने धृतो ही योगो वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२३॥

ज्या माणसाने नारीच्या उपभोगाने उत्पन्न होणारी सर्व सुखे उपभोगली ती अंत्यत नाशवंत आणि दुःखदायक आहेत, हे जाणून देखिल योगाभ्यास केला नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

विशालवेणी नयनभिरामा कदर्पसम्पूर्णनिधानरूपा ।

भुक्ता न येनैव वसन्तकाले वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२४॥

ज्या पुरुषाने वसंत ऋतुमध्ये लांब केस असलेल्या, सुंदर नेत्रांनी सुशोभित आणि कामदेवाचे समस्त भांडार असलेल्या स्त्री बरोबर विहार केला नाही, तर त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

मायाकरण्डी नरकस्य हण्डी तपोविखण्डी सुकृतस्य भण्डी ।

नृणां विखण्डी चिरसेविता चेत्‌ वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२५॥

नारी ही मायेचे भांडार, नरकाची हंडी, तपोभग्न करणारी, पुण्याचा नाश करणारी आणि पुरुषाला घातक आहे. म्हणूनच ज्या पुरूषाने तिचे दीर्घकाळ सेवन केले, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

समस्तश्रॄंगारविनोदशीला लीलावती कोकिलकण्ठनाला ।

विलासितो नो नवयौवनेन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२६॥

ज्या तरूणाने स्वतःच्या तारूण्यामध्ये सर्व प्रकारचा शृंगार, मनोविनोद करण्यात चतुर, अनेक लीलांमध्ये कुशल आणि कोकिळकंठी अशा कामिनीचा उपभोग घेतला नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

समाधिहन्त्री जनमोहयित्री धर्मे कुमन्त्री कपटस्य तन्त्री ।

सत्कर्महन्त्री कलिता च येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२७॥

समाधिचा भंग करणाऱ्या, लोकांना मोहित करणाऱ्या, धर्मविनाशिनी, कपटी, सत्कर्माचा नाश करणाऱ्या नारीशी ज्याने संबंध ठेवला त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

बिल्वस्तनी कोमलिता सुशीला सुगन्धकुन्ता ललिता च गौरी ।

नाऽश्लेषिता येन च कण्ठदेशे वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२८॥

बिल्वफळाप्रमाणे कडक उरोज असलेल्या, अत्यंत कोमल शरीर असलेल्या, प्रिय स्वभाव असलेल्या, सुगन्धी केस असलेल्या आणि लोभात पाडणाऱ्या गोऱ्या युवतीला ज्याने आलिंगन दिले नाही, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

शुक :

चिन्ता व्यथा दुःखमयी सदोषा संसारपाशा जनमोहकर्त्री ।

सन्तापकोशा भजिता च येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥२९॥

चिन्ता, पीडा तसेच सर्व प्रकारच्या दुःखाने परिपूर्ण, दोषयुक्त, संसारात बंधनरूप, लोकांना मोहित करणाऱ्या आणि संतापाचा खजिना असणाऱ्या स्त्रीचे ज्याने सेवन केले आहे, त्याचे जीवन व्यर्थ आहे.

रम्भा :

आनन्दकन्दर्पनिधानरूपा झणत्क्वणत्कड्कणनूपराढया ।

न स्वादिता येन सुधाधरस्या वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३०॥

आनंद आणि कामदेवाचा खजिना असलेल्या, खणखण करणारे कंकण आणि पैजण घातलेल्या कामिनीच्या ऒठांना ज्याने स्पर्श केला नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय.

शुक :

कापटयवेषा जनवञचिका सा विण्मूत्रदुर्गन्धदरा दुराशा ।

संसेविता येन सदा मलाढया वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३१॥

छ्लकपट करणाऱ्या, लोकांना फसवणाऱ्या, दुराशेने परिपूर्ण आणि अनेक प्रकारच्या मोहित करणाऱ्या कलांनी युक्त अशा स्त्रीचे सेवन ज्याने केले, त्याचे जीवन व्यर्थ होय.

रम्भा :

चन्द्रानना सुन्दरगौरवर्णा व्यक्तस्तनी भोगविलासदक्षा ।

नान्दोलिता वै शयनेषु येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३२॥

चंद्रमुखी, सुंदर, गौरवर्ण असलेल्या, जिच्या उरोज उठून दिसत आहेत अशा, तसेच भोग आणि विलासात चतुर अशा स्त्रिला ज्याने पलंगावर आलिंगन दिले नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय.

शुक :

उन्मेत्तवेषा मदिरासमत्ता पापप्रदा लोकविडम्बशीला ।

योगच्छला येन विभाजिता च वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३३॥

मदिरा पिऊन उन्मत्त बनलेल्या, पापदायक, लोकांना फसवणाऱ्या आणि योग्यांबरोबर कपट करणाऱ्या स्त्रीचे सेवन सेवन ज्याने केले त्याचे जीवन व्यर्थ होय.

रम्भा :

आनन्दरूपी तरूणी नताड्गी सदधर्मसंसाधनसृष्टिरूपा ।

कामार्थदा यस्य गृहे न नारी वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३४॥

आनन्दरूप, नम्र, उत्तम धर्मपालक, पुत्रादि उत्पन्न करण्यात साहाय्यक, इंद्रियांना समाधान देणारी स्त्री ज्याच्या घरी नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय.

शुक :

अशौचदेहा पतितस्वभावा वपुःप्रगल्भा वललोभशीला |

मृषा वदन्ती कलिता च येन वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३५॥

स्वतःची कामवासना पुर्ण करण्याकरीता पतित स्वभाव असलेली, शरीर सुखासाठी साहस आणि लोभ दाखविणारी तसेच खोट बोलणाऱ्या स्त्रीवर ज्याने विश्वास ठेवला, त्याचे जीवन व्यर्थ होय.

रम्भा :

क्षामोदरी हंसगतिप्रमत्ता सौंदर्यसौभाग्यवती प्रलोला ।

न पीडिता येन रतौ यथेच्छं वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३६॥

पातळ कमर असलेल्या, हंसाप्रमाणे चाल असलेल्या, प्रमत्त सुंदर सौभाग्यवती, चंचल स्वभाव असलेल्या स्त्रीला ज्याने रतिक्रीडेच्या वेळी अनुकूलरित्या समाधानी केले नाही, त्याचे जीवन व्यर्थ होय.

शुक :

संसारसदभावन भक्तिहीना चित्तस्य चौरा हदि निर्दया च |

विहाय योगं कलिता नरेण वृथा गतस्य नरस्य जीवितम्‌ ॥३७॥

संसारातल्या उत्तम भावनांना प्रकट करणाऱ्या, प्रेमाचा अभाव असलेल्या पुरूषांचे चित्त चोरणाऱ्या, हदयात दया नसलेल्या स्त्रीला ज्याने योगाभ्यास सोडून आलिंगन दिले, त्याचे जीवन व्यर्थ होय.

रम्भा :

सुगन्धैः सुपुष्पैः सुशय्या सुकान्ता वसन्तो क्रतु: पूर्णिमा पूर्णचन्द्रः ।

यदा नास्तिपुस्त्वं नरस्य प्रभूतं ततः किं ततः किं ततः किं ततः किं ॥३८॥

सुंदर सुगन्धित पुष्पांनी सुशोभित शय्या असेल, मनोनुकूल स्त्री असेल, वसंत ऋतु असेल, पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे असेल, तारुण्याने रसरसलेली असेल, परंतु ज्या पुरुषामध्ये तिच्या इच्छा पुर्ण करायची क्षमता नाही, म्हणजे तो परिपूर्ण पौरुष नाही त्याच्या जीवनाचा त्रिवार धिक्कार असो.

शुक :

सुरूपं शरीरं नवीनं कलत्रं धनं मेरूतुल्यं वचश्र्चारू चित्रम्‌ ।

हरेरंडिघ्रयुग्मे मनश्र्चेदलग्नं ततः किं ततः किं ततः किं ततः किं ॥३९॥

सुंदर शरिरसंपदा, सुंदर भार्या, मेरु पर्वताएवढे धन, मनाला भुरळ घालणारी मधुर वाणी असेल पण जर भगवान शंकराच्या चरणी मन एकाग्र होत नसेल त्या जीवाचा त्रिवार धिक्कार असो.

एकंदरीत अशा शृंगार आणि आध्यात्मिक, भोग आणि मोक्ष, संसारीक स्थूलता आणि पारमार्थिक सुक्ष्मता याबद्दल खुप सविस्तर संवाद झाला, त्यात शेवटी वैराग्याने विजय प्राप्त केला.

स्रोत :

रंभा - श्री शुकदेव जी संवाद !!!!!!! -------------- - पौराणिक कथा - mymandir

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

आपण माहिती विचारलेले चार ही महात्मा ऋषी यांना ब्रह्मवेत्ता म्हणून ओळखले जाते. त्यांच्या बद्दलची माहिती ही थोडक्यात देता येणे अवघड आहे, तरी पण अगदी थोडक्यात त्यांची माहिती देत आहे.

पद्म पुराणावर आधारीत श्री हरिविजय ग्रंथात चार ब्रह्मवेत्ता सांगितले आहे. महर्षी शुकाचार्य, महर्षी याज्ञवल्कल्य, महर्षी कपिलमुनी आणि ब्रह्म विष्णु महेश यांचा एकत्र अवतार श्री गुरु दत्तायत्रेय हे होय.

महर्षी शुक मुनी / शुकाचार्य :-

'शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे' असा ज्या ओळीत वामन पंडितांनी समर्थांचा गौरव केला आहे.

शुक हे व्यासांचे पुत्र, वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा. एक आख्यायिका अशी आहे की, एकदा एका तलावाच्या बाजूने शुकमुनी चालले होते. तलावात काही अप्सरा स्नान करीत होत्या. शुक तलावाच्या कडेने जात असताना त्या अप्सरांना अंगावरच्या कपडयांची शुध्द नव्हती. शुकांना पाहिल्यावर लज्जित व्हावे, असे त्यांना बिलकूल वाटले नाही. मात्र त्यांच्या मागून त्याच मार्गाने व्यासमहामुनी चालले होते.

व्यासांची चाहूल लागताच सगळया अप्सरांनी अंगावरची वस्त्रे क्षणार्धात सावरली. व्यासांनी त्या अप्सरांना विचारले, ''माझा तरुण मुलगा शुक आत्ताच ह्या वाटेने गेला तेव्हा तुम्हाला आपली वस्त्रे सावरावीत असे क्षणभरही वाटले नाही. मी वयोवृध्द मग मला पाहून मात्र वस्त्रे सावरण्याची लगबग तुम्ही का केलीत?''

अप्सरा उत्तरल्या, ''शुकांच्या नजरेत कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही.''

ह्या उत्तराचा पुढचा भाग व्यासांना जाणवला आणि ते पुढे चालू लागले. असे हे महाविरक्त शुकमुनी.

महर्षी याज्ञवल्क्य :-

याज्ञवल्क्य हे एक प्रसिद्ध ऋषि व स्मृतिकार होते . हे वाजसनेयी शाखेचे प्रवर्तक असून अत्यंत विद्वान होते . बृहदारण्यकोपनिषद्, शतपथ ब्राह्मण, शुक्ल यजुर्वेद, योगसूत्रें, याज्ञवल्क्यस्मृति इत्यादि ग्रंथांचें कर्तृत्व यांच्याकडे देण्यांत येतें.

बृहदारण्यकोपनिषद्, शतपथ ब्राह्मण, शुक्ल यजुर्वेद, योगसूत्रे, याज्ञवल्क्यस्मृति इत्यादि ग्रंथांचें कर्तृत्व यांच्याकडे देण्यात येते. बृहदारण्यकोपनिषदांतील त्याच्या स्तुतिपर असलेलें याज्ञवल्क्यकांड वगळता बाकी सर्व उपनिषद् त्यानेंच रचिले असावे असे दिसते. शुक्लयजुर्वेद हा यांनीच रचिला असावा असे पुष्कळांचे मत आहे. शतपथ ब्राह्मणांतील बऱ्याच भागात त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन केले गेले आहे. याज्ञवल्क्य हे जनक राजाच्या दरबारी होते असे शतपथ ब्राह्मणावरून दिसते.

बृहद्रण्यकोपनिषदात याज्ञवल्क्य या सिद्धांताने असे सिद्ध केले की ब्रह्मा हा सर्वोपरि तत्व आहे आणि अमरत्व हे त्या ब्रह्मदेवाचे रूप आहे. याज्ञवल्क्यने मैत्रेयी नावाच्या आपल्या प्रज्ञाशालिनी पत्नीस हे सांगितले होते. याज्ञवल्क्य यांनी देहाचा त्याग करून जनकांना आत्म्याची हालचाल समजावून सांगितली. हा देखील बृहद्दर्यकोपनिषदेचा विषय आहे. जनकांच्या बहु-शतकातील यज्ञात ब्रह्मास्त्रिय याज्ञवल्क्य यांनी एक हजार गायींची दक्षिणा निश्चित केली होती. शांतिपर्वाच्या मोक्षधर्म या पर्वात, याज्ञवल्क्य आणि जनक यांचे विश्‍वविद्याविज्ञानाविषयी महत्त्वाचे संभाषण नमुद करण्यात आले आहे.

गुरुदेव दत्तगुरू :-

दत्त (दत्तात्रेय) हे एक योगी असून हिंदू धर्मात त्यांना देव मानले जाते. स्वधर्म आणि स्वसंस्कृती संकटग्रस्त असताना त्यांची जोपासना व संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य दत्त संप्रदायाने केले. दत्त ही देवता अत्रि ऋषी व त्यांची पत्‍नी अनुसया यांचा पुत्र असून त्यांना दुर्वास व सोम नावाचे दोन भाऊ आहेत.

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दत्त, सोम व दुर्वास हे तिघे भाऊ विष्णू, ब्रह्मा व शिव यांचे अवतार मानले जातात. पूर्वकाळात विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या दत्ताचे स्वरूप उत्तरकाळात ब्रह्मा, विष्णु व महेश या तिन्ही देवांचे अंशरूप सामावून घेत त्रिमुखी रूपात उत्क्रमत गेले.

महर्षी कपिलमुनी :-

कपिलमुनी हे भगवान विष्णू अवतार असलेले एक आद्य पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी संख्याशास्त्राचा शोध लावला. कपिलमुनीचे वर्णन भागवत पुराणामध्ये केलेले आहे. कपिलमुनी हे बर्ह्मा पूत्र मनुचे वंशज आहेत. भागवत गीतेतील १० अध्याय मध्ये भगवतांनी अर्जुनाला विभूती योग मध्ये कपिलमुनीच्या जन्माचे महत्व सांगितले). कपिलमुनी हे साधू योगी होते. त्यांच्याजवळ आध्यात्मिक शक्ती आणि सिध्दी होती. कपिलमुनीचे वडील कर्दम मुनी आणि आई देव्हुती. कपिलमुनीच्या जन्मानंतर त्यांचे वडील घर सोडून गेले, त्यानंतर कपिलमुनिंनी त्यांच्या आईला मुक्ती(मोक्ष)ची शिकवण दिली. भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला संख्या शास्त्रा बद्दल भागवत पुराणामध्ये सांगितले. त्यालाच उद्धवा गिता म्हणतात. उत्क्रांतीचा प्रस्ताव मांडणारे कपिलमुनी पहिले होते.

'कपिलस्मृती' हे त्यांचे धर्मशास्त्र आहे. जगाला नैसर्गिक गतीचा जन्म मानून, जगातील कोणतीही गोष्ट ही नैसर्गिक कृती आहे, असे सांगितले. सुख आणि दु: ख ही निसर्गाची देणगी आहे आणि माणूस अज्ञानामुळे बांधलेला आहे. जेव्हा अज्ञान नष्ट होते, तेव्हा पुरुष आणि प्रकृती आपापल्या ठिकाणी स्थायिक होतात.

स्रोत :-

महा भागवत पुराण

श्री हरिविजय ग्रंथ.

 आहेत2 वर्षे

रत्नासुर दैत्य आणि ज्योतिबा यांची एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळातील कोल्हापूर नगरीच्या अवती भवती निसर्गाने हिरवाईची व डोंगर दऱ्यांची उधळण केली आहे. या परिसरात एक रत्नासुर प्रमुख दैत्य व इतर दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती !.

कोल्हापूरच्या अंबाबाईला सुद्धा या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. त्यानंतर या डोंगराचे नाव "वाडी रत्नागिरी" असे पडले.

रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे !.. म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबांना कोल्हापूरात रहाण्याची विनवणी करण्यात आली. त्यामुळे कोल्हापुरच्या वायव्येस १४.४५ की.मी. अंतरावर , जवळ जवळ १००० फुट ऊंच सपाट डोंगरावर ज्योतिबा आज पर्यंत नागरिकांच्या रक्षणासाठी वास्तव्य करून आहे. हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे.

ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत. ठिक ठिकाणी भाविक रवळनाथ किंवा सौदागर या नावाने पण ज्योतिबांची पुजा आराधना करतात.

देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायर्‍या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे.

"ज्योतिबा किंवा केदार" या दैवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो. महानुभावाच्या पोथ्यांमध्ये पैठण व जळगाव येथील केदारेश्वर मंदिरांचा उल्लेख आहे. खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे. अग्नी, तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो. ग्रामीण लोकगीतांतून व ओव्यांतून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे.

स्रोत :-

ज्योतिबा मंदिर - विकिपीडिया

 आहेत2 वर्षे

पंचाग्निविद्या उपनिषदातील एक विद्या आहे. क्षत्रिय राजा 'प्रवाहण जैवली' या विद्येत निपुण होता.

जी विद्या जाणल्यानंतर जाणणाऱ्याला पृथ्वीवरील मृत्यूनंतर जीव कुठे जातात, ते पुन्हा कसे काय पृथ्वीवर जन्म घेतात इत्यादी गूढतम प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे मिळतात, त्या उपनिषदांतील विद्येला पंचाग्निविद्या असे म्हणतात.

छांदोग्योपनिषदा

तील पाचव्या अध्यायातील तृतीय खंडापासून ते दहाव्या खंडापर्यंत पंचाग्निविद्येतील महत्त्वाचा सिद्धांत गोष्टीरूपाने सांगितलेला आहे. हीच कथा आणि हाच सिद्धांत बृहदारण्यकोपनिषदातील सहाव्या अध्यायातदेखील वर्णिलेला आहे.

पृथ्वीतलावर मानवाने देहत्याग केल्यानंतर तो पुन्हा जन्म घेईपर्यंत त्याच्या आत्म्याचा कोठून कुठे आणि कसा कसा प्रवास होतो, याबद्दलचा सिद्धांत या कथेतून, सिद्धान्ताला सर्वोच्च महत्व देऊन, कथित केलेला आहे. त्या काळात यज्ञाचे प्राबल्य असल्यामुळे यज्ञाचे रूपक घेऊन ही पंचाग्निविद्या सांगितलेली आहे.

महर्षी आरुणी गौतम यांचा मुलगा श्वेतकेतू आपल्या घरी वडिलांकडून सर्व प्रकारचे ज्ञान घेतो आणि त्यानंतर पांचाल देशाच्या राजसभेत जातो. तेथे राजा प्रवाहण जैवली त्याला पाच प्रश्न विचारतो. ते प्रश्न अत्यंत गहन अशा पंचाग्निविद्येवर आधारित असतात. श्वेतकेतूच्या वडिलांना ती विद्या अवगत नसल्यामुळे श्वेतकेतूला ती उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे तो शरमिंदा होतो, चिडतो, वडिलांकडे परत जातो आणि त्यांना जणू जाब विचारतो.

आरुणी गौतमांना खरेच ती विद्या माहीत नसते. त्यामुळे ते त्याला तसे सांगतात आणि मनात कोणतीही अढी किंवा भीड (भीती, संकोच) न बाळगता हातात समिधा घेऊन राजा प्रवाहण जैवलीकडे जातात. त्या काळात हातात समिधा घेऊन गुरूकडे जाणे याचा अर्थ त्या त्या गुरूचे शिष्यत्व स्वीकारणे असा असायचा. ती विद्या त्या काळात फक्त क्षत्रियांनाच अवगत असे. क्षत्रियांनी ती ब्राह्मणांना शिकवावी की नाही, हा प्रश्न त्या ज्ञानी राजाला पडतो. पण हातात समिधा घेऊन म्हणजे शरण जाऊन एखादी व्यक्ती शिष्यत्व स्वत: होऊन स्वीकारत असेल, तर विद्येपासून त्या व्यक्तीला वंचित ठेवू नये, असाही त्या काळात संकेत असल्यामुळे राजा प्रवाहण जैवली ती विद्या त्याला सांगतो. पिता–पुत्रांना त्या पाच प्रश्नांची उत्तरे मिळतात.

राजा प्रवाहण जैवलीने श्वेतकेतूला विचारलेले पाच गहन प्रश्न व श्वेतकेतूने त्या प्रश्नांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे :

१) पृथ्वीतलावरील प्रजा मृत्यूनंतर नेमकी कुठे जाते?

उत्तर : पृथ्वीतलावरील प्रजा मृत्यूनंतर अंतरिक्षात म्हणजे द्यूलोकात जाते.

२) प्रजा मृत्यूलोकात परत कशी येते?

उत्तर : पंचाग्नी सिद्धांतानुसार पाच टप्प्यांतून प्रजेचा (मानवांचा) पुन्हा जन्म होतो.

३) देवयान व पितृयान हे मार्ग कुठल्या स्थानापासून वेगळे होतात?

उत्तर : संवत्सराच्या अयनापर्यंत हे दोन्ही मार्ग जवळजवळ आहेत. पण त्या स्थानानंतर ते वेगवेगळे होतात.

४) सर्वजण जर मृत्यूनंतर पितृलोकात जात असतील, तर तो लोक ओसंडून कसा जात नाही?

उत्तर : मृत्यूनंतर काहीजण देवयान मार्ग किंवा पितृयान मार्ग (धूम्रयान मार्ग) यातील कुठल्याच मार्गाने पुढे पुढे जात नाहीत. पुनःपुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात सापडतात. म्हणून परलोक ओसंडून जात नाही.

५) पाचव्या आहुतीला ‘आप’ हा (घटक) ‘पुरुष’ कसा बनतो?

उत्तर : या प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी प्रथम आकाशात ‘यज्ञ’ चालू आहे, असे समजणे आवश्यक आहे. पृथ्वीतलावरील प्रजा मृत्यूनंतर द्यूलोकात गेलेली असते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आकाशातल्या अग्नीत देव हे ‘श्रद्धेची’ म्हणजे ‘सूक्ष्म जलाची’ आहुती देतात. पाऊस हा जर यज्ञातील अग्नी मानला, तर ‘मूळ विशुद्ध सूक्ष्म जल’ हे ‘सोम’ बनते. नंतर त्याचाच वर्षाऋतूत वर्षाव होतो. पुढे या पर्जन्यातूनच अन्नाची निर्मिती होते (पावसाच्या पाण्याशिवाय अन्नधान्याची निर्मिती होऊ शकत नाही). अन्न सेवन केल्यानंतर पुरुष-शरीरात सप्त धातू निर्माण होतात. रेत/वीर्य हे या सप्त धातूंपैकी एक होत. याद्वारे नवीन जन्म-संभव शक्य असतो. हे रेत/वीर्य जेव्हा स्त्री-शरीरात प्रवेश करते, तेव्हा गर्भ तयार होतो. अशाप्रकारे पाचव्या यज्ञातील पाचव्या आहुतीला ‘आप’ (श्रद्धारूपी जल) हा (घटक) ‘पुरुष’ (मानव) बनतो.

पंचाग्निविद्या हे पाच यज्ञांचे रूपक आहे. या विद्येच्या माध्यमातून जो परमात्म्याला जाणतो, तो मुक्त होतो, असे वर्णन छांदोग्योपनिषदात आले आहे.

त्या काळात यज्ञाचे प्राबल्य असल्यामुळे यज्ञाचे रूपक घेऊन ही विद्या सांगितलेली आहे. आजच्या संशोधनीय भाषेत हा एक सिद्धांतच आहे; कारण यात एक निश्चित असा क्रम आहे. त्यातून निश्चित केलेला नियम आहे. त्या काळात अशा गूढ असलेल्या सिद्धांताला ‘विद्या’ म्हणत असत.

प्रत्येक यज्ञामध्ये एक अग्निकुंड असते. आहवनीय अग्नी असतो. त्यात घालायला समिधा लागतात. त्यांचे हवन केल्यावर धूर निघतो, ज्वाला निघतात. निखारे असतात, ठिणग्या निघतात. हे ध्यानात घेऊन हे यज्ञाचे रूपक रचलेले आहे.

द्यूलोक, पर्जन्य, पृथ्वी, पुरुष, स्त्री, या पाच आहवनीय अग्नींमध्ये त्या त्या समिधांचे हवन केल्यानंतर धूर, ज्वाला, निखारा आणि ठिणग्या यांचे अस्तित्व दिसून येते. हे ‘यज्ञाचे पद्धतीशास्त्र’ आहे. हा सर्व अर्थ ‘रूपक’ म्हणून समजून घ्यायचा आहे. जीव-निर्मितीची वैश्विक क्रिया-प्रक्रिया हाच एक जणू यज्ञ आहे. जन्म-मृत्यूचे रहस्य यामध्ये सामावलेले आहे. असेही सूचित केले आहे की, ‘एका जीवाचा जन्म’ ही देव आणि त्याने निर्माण केलेला निसर्ग यांनी घडवून आणलेली वैश्विक प्रक्रिया असते.

हा विषय अनुभवनिष्ठ संशोधनाचा विषय नाही. पण हिंदू धर्मातील पुनर्जन्म सिद्धांतावर आधारित मानवी जन्म-मृत्यू-जन्म या प्रक्रियेची सविस्तर मांडणी या पंचाग्नीविद्येच्या अनुषंगाने छांदोग्योपनिषदात आणि बृहदारण्यकोपनिषदात मांडलेली दिसून येते.

संदर्भ :

  • फडके, पुरुषोत्तमशास्त्री; दुनाखे, अंशुमती, सार्थ छांदोग्य उपनिषद, पुणे, २०१४.
  • रानडे, रा. द.; अनु. गजेंद्रगडकर, कृ. वें. उपनिषद रहस्य, विजापूर, २००३.

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

भगवान श्रीकृष्णानी मथुरेत देवकी वासुदेव यांच्या पोटी जन्म घेऊन आपले पृथ्वीवरील अवतार कार्य सुरू केले होते. कुलऋषी गर्ग मुनी यांनी श्रीकृष्णावर खुप जीव घेणे विघ्न येतील असे भाकीत वर्णन केले होते. भगवान श्रीकृष्ण गोकुळात आपल्या बाल - लीला नंद - यशोदा यांच्यासह सर्व गोकुळवासियांना दाखवून मोहून टाकले होते.

कंसाला इकडे आठवा - आठवा अशा मृत्यू भयाने चिंतातुर केले होते. महाबळ आणि पुतना यांच्या वधामुळे आगीत तेल टाकल्याप्रमाणे कंस चिंतेने होरपळून निघाला होता. त्याच वेळेस तृणावर्त या दैत्याने मी कृष्णाला हवेत उडवून त्याचा वध करील अशी शपथ कंसा समोर घेतली. तृणावर्त आकाश मार्गे वायुवेगाने गोकुळाकडे निघाला.

श्रीकृष्ण कोण आहे, याची तृणवर्ताला कल्पना नव्हती. नंदयशोदेचे पूर्वजन्मींचे केवढे पुण्य ! प्रत्यक्ष शेष व विष्णू त्यांच्या अंगणात आणि अंगाखांद्यावर खेळत आणि परमोच्च आनंद देत ! अहो, वेदांना अगम्य विराटपुरुष गोकुळात गोपांकडून बोबडे बोल शिकत होता ! आणि ज्याचे रहस्यमय वचन देवांना आकलन होत नाही त्याचे बोबडे बोल गोपगोपींना कळत नव्हते ! ते दोघे ज्या क्रीडा करीत त्यांनी शहाणी शहाणी माणसेही त्यांच्यासाठी वेडी होत.

कंसाला मात्र चिंता सतावीत होती. श्रीहरिविजय ग्रंथात पुढील प्रमाणे त्याचे वर्णन आलेले आहे.

चित्रस्रोत : गुगल

इकडे मथुरेसी कंस चिंताक्रांत । म्हणे वैरी वाढतो गोकुळांत । आताकोण जाऊनि अकस्मात । वधूनि येईल तयातें ॥१०६॥

तों तृणावर्त म्हणे कंसातें । मी वधीन तुझ्या अरीतें ।
वायुरूपें गगनपंथें । अकस्मात आणीन मी ॥१०७॥

जैसा पक्षी आमिष उचलीत । तैसा उडवीन अकस्मात ।
कीं सुधारसघट त्वरित । उरगरिपु नेत जैसा ॥१०८॥

तैसा अकस्मात शत्रूसी । उचलूनि आणीन तुजपासीं ।
तृणावर्त बोलतां मानसीं । कंसरावो संतोषला ॥१०९॥

वस्त्रें भूषणें देऊनि गौरविला । तृणावर्त वायुरूपें चालिला ।
गोकुळासमीप पातला । वात सुटला अद्‌भुत ॥११०॥

इकडे यशोदा आपलें आंगणीं । कडे घेऊनि चक्रपाणी ।
उभी ठाकली ते क्षणीं । गौळिणींसी बोलत ॥१११।।

जगदात्मा मनमोहन । तृणावर्त येतो जाणोन ।
काय करी जगज्जीवन । जड बहुत जाहला ॥११२॥

चित्रस्रोत : गुगल

जड बहुत हरि वाटला । यशोदेनें खालीं उतरिला ।
हरि दुडदुडां बाहेर गेला । तों सुटला वात प्रचंड ॥११३॥

सुटला हो प्रलयसमीर । धुळीनें भरलें अंबर ।
त्यामाजी गोकुळ समग्र । दिसेनासें जाहलें ॥११४॥

एक मुहूर्तपर्यंत । हलकल्लोळ गोकुळीं होत ।
वृक्ष उन्मळोनि जात । आकाशमार्गें द्विज जैसे ॥११५॥

न दिसे कोणी कोणातें । माता नोळखे बाळकांतें ।
नेत्र झांकोनि निजहस्तें । जन जाहले मूर्च्छित पैं ॥११६॥

वाटे पृथ्वी जाते रसातळांत । कीं गोकुळ उडालें आकाशपंथें ।
कीं गगन आलें खालतें । अवनी वरी गेली पैं ॥११७॥

चहुंकडे वृक्ष उडोन । पडती गोकुळावरी कडकडोन ।
मंदिरें जाती मोडून । विदारती प्रळयवातें ॥११८॥

तृणावर्त हरीसी उचलोन । निराळमार्गें गेला घेऊन ।
तें जाणोनि मनमोहन । स्वरूप अद‌भुत प्रकटवी ॥११९॥

ग्रीवेसी धरिला तृणावर्त । श्रीहरीचें बळ अद‌भुत ।
शिरकमल अकस्मात । पिळूनि खुडिलें केशवें ॥१२०॥

गोकुळप्रदेशीं अरण्यांत । पडिलें तृणवर्ताचें प्रेत ।
मागुती कमलदलाक्ष गोकुळांत । प्रवेशला तेधवां ॥१२१॥

वायु राहिला अद्‌भुत । लोक झाले सावचित ।
यशोदा म्हणे कृष्णनाथ । काय जाहला येथूनि ॥१२२॥

यशोदा चहूंकडे धांवत । आळोआळीं कृष्ण पाहत ।
धबधबां वक्षःस्थळ बडवीत । थोर आकांत जाहला ॥१२३॥

नंद धांवे बिदोबिदीं । गौळी हुडकिती सांदोसांदीं ।
यशोदेभोंवतीं मांदी । गौळिणींची मिळाली हो ॥१२४॥

गोकुळींचे जन समस्त । बुडाले शोकसमुद्रांत ।
तों दुडदुडां धांवत । कृष्ण येतां देखिला ॥१२५।।

मायेनें धांवोनि उचलिला । सप्रेम हृदयीं आलिंगिला ।
नंद गौळी ते वेळां । परमानंदें धांवती ॥१२६॥

नंदें हरि कडे घेतला । म्हणे कोठें गेला होतासी बाळा ।
इंदिरावर मंदिरीं आणिला । मोठा सोहळा नंद करी ॥१२७॥

भावार्थ :-

इकडे आनंदाला भरती आली होती पण तिकडे कंसाच्या सभेत तृणावर्त नांवाचा दैत्य कृष्णाचा घात करण्याची प्रतिज्ञा करीत होता ! झंझावाताचे रूप घेऊन कृष्णाला आकाशात उडवून न्यावे व खाली फेकून मारून टाकावे असा त्याचा बेत होता. कंसाची आज्ञा घेऊन तो सूक्ष्म रूपाने गोकुळात आला. कृष्ण अंगणात खेळत होता. अचानक वावटळ उठली. धूळ उडून काही दिसेनासे झाले. तृणावर्ताने वायूच्या झोताबरोबर बालकृष्णाला आकाशात उंच नेले ! कृष्णाला हे दैत्याचे रूप कळले. त्याने आपले शरीर अत्यंत जड केले आणि आपल्या अचिंत्य योगशक्तीने तृणावर्ताला त्याचे स्वतःचे रूप घ्यायला लावले; तो तृणावर्ताच्या मानेला मिठी मारून खांद्यावर बसला; त्याची मान आवळू लागला. गोकुळापासून दूरवर तृणावर्ताने त्यावेळी कृष्णाला वाहून नेले होते.

चित्रस्रोत : गुगल

कृष्णाची अशी काही घट्ट मिठी त्याच्या गळ्याला बसली की त्याचा गळा आवळला जाऊन तो गतप्राण झाला. उंचावरून धाडकन भूमीवर कोसळला ! वावटळ शमली, धूळ खाली बसली. वादळाने वृक्ष मोडून पडले होते, तृणावर्ताच्या प्रचंड शरीराखाली आणखीनच पुष्कळ वृक्षांचा चुराडा झाला ! कृष्ण मात्र त्या दैत्याच्या खांद्यावर बसून राहिला होता !

गोकुळवासी भराभर घराबाहेर पडले ! वृक्षांची, गोठ्यांची नासधूस झालेली ! दैत्य पडताच झालेल्या आवाजाने सगळे अरण्याकडे धावले ! पहातात तो मोठा दैत्य आडवा पडलेला, आणि कृष्ण त्याच्या खांद्यायर बसलेला ! गोपांनी त्याला उचलून आणले ! यशोदा धावतच येत होती ! तिच्या हाती कृष्णाला देत गोपांनी सर्व प्रकार तिला दाखविला ! कृष्ण यशोदेच्या जवळ बसून दैत्याकडे बोट दाखवून हसत होता !

तृणावर्त दैत्याचे हे आणखी एक संकट ! गोकुळवासी चिंतातुर झाले ! निसर्गातील विध्वंसक शक्तीचे रूप घेऊन दैत्य कृष्णावर हल्ला करीत होते ! भगवान श्रीकृष्ण मात्र अशा एक एक शक्तींचा वध करीत होते. अशाच प्रकारे दैत्य तृणावर्त दैत्याचा पण वध केला..!

स्रोत :- श्रीहरीविजय ग्रंथ.

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

अंगिरा ऋषी पुत्र घोर ऋषींचे पुत्र कण्वऋषी, हे भारतीय पुराणकथांमधील एक ऋषी होते. कण्वऋषींनी विश्वामित्र व मेनका यांच्या शकुंतला या कन्येचा सांभाळ केला.

कण्व ऋषींनी कण्वनीति, कण्वसंहिता, कण्वोपनिषद्‌ आणि कण्वस्मृति नावाचे ग्रंथ लिहिले होते. कण्वाच्या वंशजांनी ऋग्वेदाचे आठवे मंडल रचले. यांनीच यजुर्वेदात कण्वशाखा स्थापन केली.

वशिष्ठ, विश्वामित्र, कण्व, भारद्वाजा, अत्री, वामदेव आणि शौनक - या सात मुनींनी या देशाला इतके काही दिले की कृतज्ञ देशाने त्यांना आकाशातील नक्षत्रात ठेवून अशी अमरत्व दिली की सप्तर्षी शब्द ऐकल्यावर आपण आकाशाची कल्पना करू शकतो. नक्षत्रांवर विसंबून असतो.

चित्रस्रोत : गुगल

याशिवाय असे समजले जाते की वरील सात ऋषी मुळे अगस्त्य, कश्यप, अष्टवक्र, यज्ञवल्क्य, कात्यायन, ऐतरेय, कपिल, जेमिनी इत्यादी सर्व ऋषींना समान दर्जा प्राप्त आहे.

पौराणिक ग्रंथात सर्वात महत्वाचे यज्ञ, सोमयज्ञ, कण्व ऋषींनी आयोजित केले होते, असे संदर्भ आढळतात. कण्व ऋषी यांना वैदिक काळातील ज्ञानी ऋषी म्हणून ओळखले जाते.

ऋग्वेदातील आठव्या मंडलामधील १०३ सुक्त महर्षि कण्व आणि त्याचे वंशज आणि गोत्रजांनी उच्चारलेले आहेत. काही स्तोत्रांचे इतर द्रष्टेसुद्धा आहेत. 'प्रधान्येन व्यापदेशा भवन्ती' नुसार महर्षि कण्व आठव्या मंडलातील द्रष्टा ऋषी म्हणून ओळखले जातात. यामध्ये सांसारिक ज्ञान-विज्ञान आणि दुष्परिणाम संबंधित उपयोगी मंत्र आहेत.

चित्रस्रोत : गुगल कण्व ऋषी आश्रम

उत्तराखंड मधील सोनभद्र जिल्हा मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर कैमूर शृंखला शिखरावर असलेली कंडाकोट ही भुमी कण्व ऋषींची तपश्चर्या भुमी म्हणून ओळखली जाते.

कण्व ऋषींचे पिताश्री घोर ऋषी हे ब्रह्मदेवाचे नातू तर अंगिरस ऋषींचे पुत्र होते. त्यांच्या वंशजांची वंशावळ वेद आणि पुराणात सापडते. चक्रवर्ती सम्राट भरत हे कण्व ऋषींच्या आश्रमात लहानाचे मोठे झाले.

कण्व ऋषी यांना एक पुत्र होता, ज्यांचे नाव ब्रह्मर्षि सौभरी होय. त्यांचे वंशज "आदिगौड सौभरेय ब्राह्मण" म्हणून स्वतःची ओळख सांगतात. त्यांचा रहिवास यमुना नदीच्या काठावरील सुनरख वृंदावन, मथुरा आणि आसपासच्या भागात आहे. गोकुळजवळ स्थायिक झालेल्या कृष्णाच्या मोठ्या भावाच्या "दाऊजीचे शहर" येथे त्याचे वंशज "दाऊ मठ" या ठिकाणी पुजारी म्हणून आहेत ज्यांना पंडा म्हणून ओळखले जाते.

याखेरीज राजस्थान, मध्य प्रदेश इत्यादी राज्यातही "आदिगौड सौभरेय ब्राह्मण" यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याबद्द्ल विष्णू पुराण आणि भगवद पुराणात उल्लेख आढळतो. द्वापार युगात जन्मलेले, गुरु संदीपणी हे भगवान श्रीकृष्णाचे गुरु होते. श्री कृष्ण आणि बलराम यांना संदीपनी ऋषींनी त्यांच्या गुरुकुलात शिक्षण दिले होते. कण्व ऋषींचे पिता महर्षी घोर हे सुद्धा हे संदीपनी ऋषी प्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम यांचे गुरु होते.

कण्व ऋषींचे वडील घोर ऋषी हे अंगिरस ऋषी इतकेच तेजस्वी आणि ज्ञानी होते. वडिलांच्या नावामुळे महर्षी घोर यांना "घोर अँगिरस" म्हणून पण ओळखले जाते.

स्रोत :-

कण्व - विकिपीडिया
घोर नावाच्या ऋषींचे पुत्र कण्व मुनी, हे भारतीय पुराणकथांमधील एक ऋषी होते. कण्वमुनींनी विश्वामित्र व मेनका यांच्या शकुंतला या कन्येचा सांभाळ केला. कण्व ऋषींनी कण्वनीति, कण्वसंहिता, कण्वोपनिषद्‌ आणि कण्वस्मृति नावाचे ग्रंथ लिहिले होते. कण्वाच्या वंशजांनी ऋग्वेदाचे आठवे मंडल रचले. यांनीच यजुर्वेदात कण्वशाखा स्थापन केली.

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

नाग हा शब्द संस्कृत आणि पाली आहे. संस्कृतमध्ये सापाला नाग, सर्प, दंदशुक, उरग असे शब्द वापरलेले आढळतात.

भारतातील एक प्राचीन वंश. भारतात नाग राजे फार प्राचीन काळापासून राज्य करीत असावेत पण त्यांचे फार थोडे उल्लेख आढळतात. पुराणांत नाग राजांनी विदिशा, मथुरा, कांतिपुरी आणि पद्मावती येथे राज्य केल्याचा उल्लेख आहे. तसेच विदिशेच्या सदाचंद्र, चंद्रांशू, नखवान, धनधर्मा, भूतिनंद इ. नाग राजांचा नामनिर्देश आहे पण याशिवाय इतर काही माहिती मिळत नाही. मथुरेत सात आणि पद्मावतीत नऊ नाग राजे होऊन गेले असे म्हटले आहे पण त्यांच्या नावांचा नक्की संदर्भ मिळत नाही.

चित्रस्रोत : गुगल

पौराणिक अनेक हिंदू धर्मातील नागाचे उल्लेख भागवत पुराण, ब्रह्माण्डपुराण, मत्स्य पुराण, विष्णु पुराण,शिव पुराण आहे.

कद्रू एक हजार तेजस्वी नाग माता;दक्ष प्रजापतीची मुलगी, महर्षि कश्यप यांची पत्नी

एकदा महर्षी कश्यप म्हणाले, 'तुला जे पाहिजे ते वर माग.' कद्रूने एक हजार तेजस्वी नाग पुत्रांच्या रूपात वर मागितला (महाभारत, आदिपर्व, १६.८).

नाग माता पत्नी कद्रूने त्यांना अनंत, वासुकी, कम्बल, कर्कोटक , पद्म, महापद्म, शंख, कुलिक आणि अपराजित असे अनेक नागपुत्रांना जन्म दिले. कश्यपच्या या सर्व पुत्रांना नाग म्हटले जाते. त्याचे मुलगे, नातवंडे अतिशय क्रूर आणि विषारी होते.

चित्रस्रोत : गुगल

पौराणिक सर्प नाग वंश बहुतेक वेळा हिंदू, जैन, बौद्ध धर्मातील ग्रंथाच्या चित्रात आढळतो. नागांचे शक्तिशाली, भव्य, आश्चर्यकारक आणि गर्विष्ठ असे वर्णन केले आहे. त्यांचे भौतिक स्वरूप एकतर मानव, आंशिक मानवी-सर्प किंवा संपूर्ण सर्प असे असते. यांचे निवासस्थान नागलोक वा पातालमध्ये आहे. भूमिगत रत्ने, सोने आणि इतर नागलोक किंवा पाताललोक नावाच्या पृथ्वीवरील खजिनांनी भरलेले आहेत. नद्या, तलाव, समुद्र आणि विहिरींसह - पाण्याचे प्राण्यांसह ते बर्‍याचदा संबंधित असतात आणि ते खजिनाचे रक्षक असतात. त्यांच्या सामर्थ्याने आणि विषाने त्यांना मानवांसाठी संभाव्य धोकादायक बनविले. तथापि, त्यांनी अनेकदा हिंदु पौराणिक कथांमध्ये नायक भूमिका साकारल्या. समुद्रमंथन पुराणकथांमध्ये, वासुकी, नागराज, जो भगवान शंकराच्या गळ्यावर असतो, तो समुद्र मंथनासाठी दोर बनला. त्यांचे शत्रू म्हणजे गरुड-देवता आहे.

पौराणिक ग्रंथात पुढीलप्रमाणे अष्टनागांची नावे आहेत- शेष (अनंत), वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख.

भारतात, वरील आठांच्या कुळाचे विस्तार झाले ज्यामध्ये नागवंशी आहेत- नल, कवर्धा, फणि-नाग, भोगिन, सदाचंद्र, धनधर्मा, भूतनंदि, शिशुनंदि किंवा यशनंदि तनक, तुश्त, ऐरावत, धृतराष्ट्र, अहि, मणिभद्र, अलापत्र, कम्बल, अंशतर, धनंजय, कालिया, सौंफू, दौद्धिया, काली, तखतू, धूमल, फाहल, काना, गुलिका, सरकोटा, कालिया, अश्वसेन इतर साप कुळांची नावे आहेत.

अथर्ववेदमध्ये काही नागांच्या नावांचे उल्लेख आढळतात. हे नाग आहेत- श्वित्र, स्वज, पृदाक, कल्माष, ग्रीव आणि तिरिचराजी. नागांमध्ये चित कोबरा (पृश्चि), काळा फणियर (करैत), गवत रंगीत (उपतृण्य), पिवळा (ब्रम), असिता रंगरहित (अलीक), दासी, दुहित, असति, तगात, अमोक आणि तवस्तु अशा इतर कुळांची नावे आढळतात.

पौराणिक कथांनुसार पाताळात एका जागी नागलोक हे मानवी स्वरूपात सर्प होते. सात प्रकाराच्या पातालपैकी महातळात नागलोक वसलेलं होते. जेथे कश्यपच्या पत्नी कद्रू आणि क्रोधवश उत्पन्न झालेले अनेक डोक्यांचे नाग आणि सर्पांचा एक गट राहत होता. त्यात कहुक, तक्षक, कालिया आणि सुषेण आदि मुख्य सर्प होते.

१.) महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाचा नाग गुंडाळेला असतो.

चित्रस्रोत: गुगल - वासुकी नाग

२. ) भगवान विष्णू शेषनागच्या शैय्यावर झोपले असतात.

चित्रस्रोत: गुगल - शेष नाग

३. ) खांडववनात जेव्हा आग पेटली होती तेव्हा अश्वसेन नावाचा नाग वाचून गेला होता ज्याला अर्जुनाशी बदला घ्यायचा होता.

चित्रस्रोत: गुगल- अश्वसेन - अर्जुन युद्ध.

४.) राजा परीक्षित यांना जेव्हा तक्षक नागाने दंश केले तेव्हा त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा मुलगा जनमेजयने नागयज्ञ करून सर्व सर्पांचा वध केला.

चित्रस्रोत: गुगल - तक्षक

ज्यामध्ये वासुकी, तक्षक आणि कर्कोटक हे साप वाचले होते. इंद्राने वासुकी आणि तक्षकांचा बचाव केला, तर कर्कोटक उज्जैनमधील महाकालच्या आश्रयामध्ये राहून जिवंत राहिले.

चित्रस्रोत: गुगल - कर्कोटक

५.) कालिंदिच्या डोहात भगवान श्रीकृष्णाने कालिया मर्दन केले.

चित्रस्रोत: गुगल - कालिया

६.) पद्म नाग ,गोमती नदीजवळील नेमिश नावाच्या प्रदेशावर पद्म नागाचे राज्य होते. नंतर ते मणिपूरमध्ये आहे. आसाममधील नागवंशी त्यांच्या कुळातील आहेत.

चित्रस्रोत: गुगल -पद्मनाग

नवनागस्तोत्र :

अनंतं वासुकीं शेषं पद्भनाभं च कम्बलम्।

शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥

एतानि नवनामानि नागानां च महात्मनाम्।

सायंकाले पठेन्नित्यं प्रात:काले विशेषत:।

तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥

॥ इति श्री नवनागस्तोत्रं संपूर्ण ॥

स्रोत :

नागदेवता - विकिपीडिया

पौराणिक नागांची नावे

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

'नल कुबेर' आणि 'मनिभद्र', ही दोघे देवांचा खजिनदार कुबेर याची मुल आहेत. कुबेराची मुल असल्याचा यांना अत्यंत अंहकार झाला होता. त्या अंहकारामुळे ही ऋषी - मुनींना पण मान - सन्मान किंवा आदर तिथ्य करीत नव्हते. तसेच कुबेराची मूल असुन पण यांना मद्दपानाचा शोक होता.

मद्यपान केल्यामुळे ते कोणाचाही अपमान करीत असत. या बद्दल सविस्तर माहिती "श्री हरिविजय" या ग्रंथात दिलेली आहे.

चित्रस्रोत : गुगल

हे होते पूर्वी कुबेरपुत्र । नांवें यांची नलकूबेर मनिभद्र।
परम उन्मत अविचार । सारासार कळेना ॥८५॥
नग्न होऊनि स्त्रियांसमवेत । जलक्रीडा दोघे करीत ।
तों नारदमुनि अकस्मात । त्याचि पंथें पातला ॥८६॥
दृष्टीं देखिला ब्रह्मसुत । परी ते विषयांध उन्मत्त ।
परम अविचारी शंकरहित । नारदें ते देखिले ॥८७॥
आधींचि तारुण्यमदें मातले । त्याहीवरी मद्यपान केलें ।
विशेष शब्दज्ञान शिकले । बोलों न देती कोणातें ॥८८॥
त्याहीवरी भाग्यमंद । स्त्रीसंगमे झाले विषयांध ।
तेचि चांडाळ भाग्यमद । जे अपमानिती साधूंतें ॥८९॥
आम्ही जाणते सर्वज्ञ । म्हणोनि संतांसी ठेविती दूषण ।
ऐसियांसी संतीं दंडून । शुद्धमार्गीं लावावे ॥९०॥
जो पिशाच जाहला निश्चितीं । त्यासी पंचाक्षरी दृढ बांधिती ।
तैसे दुष्ट दंडून संतीं । भजनस्थितीं लावावे ॥९१॥
असो नारदें कोपोनी । ते दुष्ट शापिले तेचि क्षणीं ।
म्हणे दोघे वृक्ष होवोनी । जडमूढदशा पावाल ॥९२॥
ऐसे ऐकतांचि वचन । दोघीं धरिले नारदाचे चरण ।
म्हणती स्वामी शापमोचन । देऊनि वरदान करावें ॥९३॥
मग नारद बोले ते वेळीं । तुम्ही वृक्ष व्हाल गोकुळीं ।
रांगत येईल वनमाळी । उद्धरील उभयांतें ।९४॥
त्यांचा करावया उद्धार । उखळ ओढीत यादवेंद्र ।
दोन्ही वृक्षांतून सर्वेश्वर । रमावर चालिला ॥९५॥
वृक्षसंधीं अडकलें उखळ । एकांत देखोनि वैकुंठपाळ ।
दोन्ही वृक्ष सबळ । बळें उन्मळोनि पाडिले ॥९६॥
तो दोन्ही वृक्षांमधूनी । दोन पुरुष निघाले तेच क्षणीं ।
उभे ठाकले कर जोडोनी । हरिस्तवनीं प्रवर्तले ॥९७

यशोदेला दोर कमी पडु लागले म्हणुन, कृष्णाने स्वतःला उखळीशी बांधून घेतले. मुकाट्याने बसला. आईला वाटले, 'भली खोड मोडली ?' पण आईचे लक्ष नाही असे पाहून कृष्णाने उखळी आडवी पाडली व ती ओढीत अंगणात नेली.

अंगणाच्या सीमेवर दोन अर्जुनवृक्ष जवळ जवळ होते. कृष्णाने ती उखळी त्यांच्या मधून पलीकडे नेण्याचा प्रयत्‍न चालविला. त्याने एवढ्या जोराने उखळी ओढली की ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले ! धाडदिशी आवाज झाला !

वृक्ष पडतांच दोन गंधर्व त्यांतून प्रकट झाले. कृष्णाची त्यांनी स्तुती केली, त्याला वंदन केले. उखळी त्या वृक्षातच अडकलेली होती. ते गंधर्व अंतर्धान पावले ! कुबेराचे नलकूबेर व मनिभद्र असे दोन पुत्र होते ते ! ते पूर्वी आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा करीत होते तेव्हा नारदमुनी तेथे गेले पण त्यांनी नारदांना योग्य तो मान दिला नाही म्हणून त्यांनी त्या दोघांना 'तुम्ही झाडे व्हाल' असा शाप दिला होता. आणि हरी हाच कृष्णावतारात तुमची त्या वृक्षरूपातून सुटका करील असा उःशापही दिला होता. तेच गंधर्व आता मुक्त झाले होते. कृष्णाला व त्याच्या काही सवंगड्याना ते दिसले होते. इतरांना मात्र दिसले नाहीत.

अशी ही पौराणिक कथा आहे.

स्रोत :

अध्याय नववा - श्री हरिविजय ग्रंथ.

 

Revti Joshi साठी प्रोफाइल फोटो

गांगेपेक्षा सुधा नर्मदा नदी पवित्र आहे ..

शंकराची आराधना करून तिने अमरकांतक इथिल मैकाल पर्वतावरून उगम घेतला. म्हणून तिला मैकल कन्या देखील म्हणतात.. रेवा, अमरजा अश्या नावाने देखील ती ओळखली जाते.. गंगा नदी काठी एक दिवस राहिल्याने तपाचारण केल्याने पूजा केल्याने मनुष्य पापा तून मुक्त होतो पण नर्मदा नदीच्या नुसत्या दर्शनाने मनुष्य सप्तजन्माच्या पापातून नाहीसा होतो.. असा वरदान शंकराने नर्मदा नदीवर दिले आहे..

नर्मदा नदी शंकराची कन्या म्हणून ओळखली जाते. म्हणून ही एकमेव नदी आहे जिचं उल्लेख करताना पाहिले कन्येचा व नंतर पित्याचा उल्लेख केला जातो.. शंकराने प्रसन्न होऊन तिला तुझ्या नवनंत्र माझा उलेक्क केला जाईल असा वरदान अमारकांतक इथे दिले होते.. म्हणून नदीचा उल्लेक्ष करताना "नर्मदे हर" असा करतात याउलट गंगा नदीचा उल्लेख हर हर गांगे असा केला जातो.

शक्रणे दिलेल्या वर्डणातील एक वरदान म्हणजे नर्मदा ही अशी एकमेव नदी आहे जीच्यातील प्रत्येक दगड ह शंकराची रूप आहे.. म्हणून आपल्याला नर्मदा नदी काठी असणाऱ्या दगडात बहुतांश दगड शंकराच्या पिंडी सारखे दिसतात..

अमाराकांतक पर्वतावर ताप करताना तिला शंकराने प्रसन्न होऊन तू एकमेव नदी असशील जीची लोक परिक्रम करतील.. आणि जो तुझी परिक्रम पूर्ण करेल तो सर्व पापातून मुक्त होऊन माझ्या चरणी लीन होईल असा वर दिला आहे.. महणून नर्मदा परिक्रमेला पापामुक्ती फेरा असे सुधा म्हणतात..

 

उत्तमराव निर्मळ साठी प्रोफाइल फोटो

कुंभमेळ्याचा पौराणिक संदर्भ

देव आणि दानवामध्ये ‘अमुल्य रत्न’ आणि अमृत प्राप्त करुन घेण्यासाठी झालेल्या समुद्र मंथनाची कथा पौराणिकदृष्टया कुंभमेळयाशी निगडीत आहे. समुद्र मंथना दरम्यान मंद्राचल पर्वतास ‘रवी’ तर नागराज वासुकीचा ‘दोर’ म्हणुन उपयोग करण्यात आला. मंद्राचल पर्वत निसटून सागरात बडु नये या साठी स्वत भगवान विष्णुनी ‘कासव रुप’ घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेलला. मंथनातुन सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले व हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना ‘निलकंठ’ संबोधण्यात येते. समुद्र मंथनातुन यानंतर कामधेनु, उकश्रर्शव नावाचा हत्ती, इत्यादी रत्न प्राप्त झाले. मंथनातुन अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र जयंत याने हेरली व दानवांच्या हाती अमृतकलश लागु नये म्हणून धन्वंतरींच्या हातातुन हा कुंभ घेऊन तो पळाला. ही बाब लक्षात येताच राक्षस गुरु शुक्राचार्यानी राक्षसांना सावध केल्याने राक्षसांनी जयंताचा पाठलाग सुरु केला. देवलोकातील कालगणने प्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्ष एवढा मानला जातो. जयंत अमृत कलश दानवांच्या हाती पडु नये म्हणुन बारा दिवस अमृत कलश घेऊन पळत होता. या कालावधीत ज्या चार ठिकाणी जयंताने कलश ठेवला ती चार ठिकाणे म्हणजे हरिद्वार , प्रयागराज , नाशिक-त्र्यंबकेश्वर व उज्जैन होय. या चार ठिकाणी सुर्य, चंद्र आणि गुरु ग्रहाची विशिष्ट युती होते त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो. अमृत कलश दानवांपासुन सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव, व चंद्राची मदत झाली. स्कंदपुराणामध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणुन नव्हे तर कलशातुन अमृत सांडले म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो असाही उल्लेख आहे.

इतिहास आणि वर्तमान

  1. खरे पाहता सिंहस्थ कुंभमेळा नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या आधीपासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कावनई येथे कपिलधारा तीर्थावर भरत होता. साधू-संतांच्या वाढत्या संख्येमुळे पुढे तो त्र्यंबकेश्वर नजीक बेजे येथील चक्रतीर्थावर भरू लागला. परंतु त्याठिकाणी, शाही स्नान प्रथम कुणी करावयाचे, यावरुन शैव-वैष्णव साधू-संतांमध्ये सन १७९० तीव्र सशस्त्र संघर्ष झाला . यात संघर्षात सुमारे १२ हजार साधू मारले गेले. तेव्हां पेशवे असलेल्या सवाई माधवराव यांनी यात हस्तक्षेप करून शैवपंथीय साधूंनी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर तर वैष्णव साधूंनी नाशिक येथील रामतीर्थावर (रामकुंड) स्नान करावे असा निवाडा दिला. साधारणत: १७९३ पासून हा निवाडा लागू झाला त्याप्रमाणे नाशिक येथे वैष्णव तर त्र्यंबकेश्वर येथे शैव साधू-संतांचा सिंहस्थ कुंभमेळा दर १२ वर्षानी पार पडत आहे.

कुंभमेळा आखाडे

भारतात साधु समाजाचे तीन पंथ आहेत. ते तीन पंथ म्हणजे वैष्णव,शैव आणि नाथपंथी. नाशिक शहरात वैष्णव पंथाचे तीन आखाडे आहेत. त्यात "श्रीदिगंबर" आखाडा, "श्रीनिर्मोही" आखाडा, "श्रीनिर्वाणी" आखाडा यांचा समावेश आहे. तर, त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथाचे दहा आखाडे आहेत. त्यात श्री पंच "दशनाम" जुना आखाडा,... श्रीपंचनाम "अवाहन" आखाडा,.... श्रीपंच "अग्नि" आखाडा,.... "श्रीनिरंजनी" आखाडा,... श्रीतपोनिधी "आनंद" आखाडा पंचायती,.... श्रीपंचायती आखाडा "महानिर्वाणी",.... श्रीपंचायती "अटल" आखाडा,.... श्रीपंचायती आखाडा "बडा उदासीन" ,..... श्रीपंचायती आखाडा "नया उदासीन" ,...... श्रीपंचायती आखाडा "निर्मल" यांचा समावेश आहे.

कुंभमेळ्यातील शाही स्नानाची सुरुवात जे नागा साधू करतात त्यांचे भारतात विविध ठिकाणी मुख्यालय असलेले काही आखाडे...

१) श्री पंच "दशनाम" जुना आखाडा, वाराणसी

२) श्री पंचायती आखाडा "निरंजन" , अलाहाबाद

३)श्री शंभू पंचायती "अटल" आखाडा, वाराणसी

४) श्री पंचायती आखाडा "महानिर्वानी," अलाहाबाद

५) श्री पंचायती आखाडा "बडा उदासीन" , अलाहाबाद

६) श्री पंचायती आखाडा "नया उदासीन" , हरिद्वार

७) श्री पंच "निर्मोही" अनी आखाडा, हरिद्वार

८) श्री पंच "दिगम्बर" अनी आखाडा, हरिद्वार

९) श्री पंच "निर्वाणी" अनी आखाडा, हरिद्वार

१०) श्री पंचायती आखाडा " निर्मल", हरिद्वार

११) श्री शंभू "पंचाग्नी" आखाडा, जुनागढ गुजरात

१२) श्री पंच "दशनाम आवाहन" आखाडा, हरिद्वार

१३) तपोनिधी श्री "आनंद" आखाडा पंचायती, नाशिक

कुंभमेळा पर्वणीकाळ

भारतात दर बारा वर्षांनी कुंभमेळा होत असतो. हिंदू धर्मात कुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. हा कुंभमेळा हरिद्वार, प्रयागराज , उज्जैन आणि नाशिकमध्य़े भरतो.

ज्यावेळी गुरुचा ‘कुंभ’ राशीत प्रवेश होतो त्यावेळेस हरिद्वार येथे गंगा किनारी कुंभमेळा संपन्न होतो.

ज्यावेळी गुरुचा मेष राशीत प्रवेश होतो व सुर्य आणि चंद्र मकर राशीत प्रवेश करतात त्यावेळी प्रयागराज येथे गंगा, यमुना सरस्वती संगमावर कुंभमेळा संपन्न होतो.

ज्यावेळी गुरुचा सिंह राशीत प्रवेश होतो व सुर्य आणि चंद्र कर्कराशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी तिरावर सिंहस्थ कुंभमेळा संपन्न होतो.

ज्यावेळी गुरु सिंह राशीत व सुर्य आणि चंद्र मेष राशीत प्रवेश करतात त्यावेळेस उज्जैन येथे क्षिप्रातीरी कुंभमेळा संपन्न होतो.

दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक - त्र्यंबकेश्वर, हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात.

दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो.

बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. अलिकडे दि. ६ जानेवारी २०२३ ते दि. १८ जानेवारी २०२३ दरम्यान प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडला.

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे सन २०२६-२७ मधील कुंभमेळ्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे

(१) सिंहस्थ ध्वजारोहण (प्रारंभ) अश्विन वद्य षष्ठी

शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२६

………>>>>>

(२) प्रथम शाही स्नान आषाढ अमावस्या

सोमवार दि. २ ऑगस्ट २०२७

……..>>>>>

( ३) द्वितीय शाही स्नान श्रावण अमावास्या

मंगळवार दि. ३१ ऑगस्ट २०२७

………>>>>>

(४) तृतीय शाही स्नान भाद्रपद शुक्ल द्वादशी

रविवार दि. १२ सप्टेंबर २०२७

…………>>>>>

(५) सिंहस्थ ध्वजावतरण (समाप्ती) श्रावण शुक्ल तृतीया

सोमवार दि. २४ जुलै २०२८

श्री पंच दशनाम जुना आखाडाचे महंत तसेच पुरोहित संघाच्या यांनी वरील तिथी ज्योतिष शास्त्रानुसार काढलेल्या आहेत . श्री पंच दशमान जुना आखाडा राज्य अध्यक्ष महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज, साध्वी शैलाजामाता, त्र्यंबक आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरनंद सरस्वती महाराज, पुरोहित संघ प्रतिनिधी, साधू-महंत , साध्वी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे.

  • भाविकांची श्रद्धा…आणि कुंभमेळा
  • हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लाखो भाविक श्रध्येपोटी कुंभमेळ्याला येतात. कुणाला निमंत्रण नसते परंतु श्रध्दपोटी हजेरी लावतात.
  • आखाड्यांचे प्रमुख महंत असतात. देवतांचे पूजन, धर्मोपदेश, परंपरांचे पालन यासोबत आखाड्याच्या देशभरातील कार्यालयांच्या,आखाड्यांचे मठ,आश्रम,गोशाळा, विद्यालयेे, रुग्णालये यांच्यासह जमिनी व संपत्तीच्या व्यवस्थापनाचे प्रशासकीय अधिकार त्यांच्याकडे असतात. परिषदेच्या मान्यतेने महंताई किताब प्रदान करण्यात येतो. त्याची शिफारस गुरू करतात. गुरूंची सेवा व मर्जी महत्त्वाचा निकष असतो. म्हणूनच आखाड्यांच्या मालमत्तेवरून काही वेळा गुरू - शिष्य आणि शिष्य - शिष्य यांच्या अनेकदा हाणामाऱ्या व हत्यांच्या घटना घडल्याचाही इतिहास आहे. आखाडा प्रमुख या नात्याने धर्मसत्ता व अर्थसत्ता आणि राज्यसत्तेची जवळीक साधून भौतिक साधन संपत्ती मिळवणे तसेच त्याच्या बदल्यात राजसत्तेला भक्तरुपी मतपेढीचा एकगठ्ठा आशीर्वाद देणे हे ओघाने आलेच !!
  • भक्तांना विरक्तीचा उपदेश करणाऱ्या या साधुमहंतांचे धर्मसत्तेआडून अर्थसत्ता व राजसत्तेसोबत सुरू असलेल्या या साट्यालोट्याला इतिहास साक्षी आहे. मालमत्तेच्या व गादीच्या वादातून आतापर्यंत आखाड्यांचे साधू, गुरू आणि शिष्य यांच्यात अनेक हत्या, वाद झाल्याची उदाहरणे आहेत.
  • अर्थात याला धर्माप्रती निरलस, निरपेक्ष, निस्वार्थ निस्पृह सेवाभाव जपणारे काही आदरणीय /सन्माननीय मोजके अपवादही आहेत, नाही असे नाही.
  • सामान्य भाविकांना मद, मोह, मत्सर, असूया, मानापमान, अहंकार, अधिकार, लोभ, या भौतिक/ अभौतिक मायाजाला पासून दूर राहाण्याचा धर्मोपदेश देणाऱ्या साधूमहंतांच्या या आखाड्यांभोवती मात्र यांची छाया दिसून येते. भौतिक मालमत्ता कशी एकवटलेली आहे, ती कशी आली व ती कशी वाढते आहे याला सुध्दा इतिहास आहे. थोडेसे मागे जाऊ या…. कुंभमेळ्यातील मिरवणुकीला "शाही मिरवणूक' आणि स्नानाला "शाही स्नान' म्हणतात, याचे कारण म्हणजे , तत्कालीन राजेमहाराजांनी त्यांची "शाही' व्यवस्था करण्याची परंपरा राखली होती. त्यामुळे त्यावेळेपासून कुंभमेळ्याच्या काळात व नंतरही सर्व प्रकारच्या सत्ताधाऱ्यांकडून आखाड्यांना मोठ्या प्रमाणात मौल्यवान धातूंच्या देवता, जडजवाहर, छत्रे, पालख्या, आसने, सोने, चांदी, हिरे, माणके आदी ऐवज व आखाड्यांच्या देखभालीसाठी शेकडो एकर इनामी जमिनी देण्यात आल्याचे दाखले इतिहासात सापडतात. पुढे स्वातंत्र्योत्तर काळातही देवस्थानच्या जमिनींना कुळ कायद्यातून वगळण्यात आल्याने त्या शेकडो एकर जमिनी आखाड्यांच्या मालकीत कायम राहिल्या. विशेषतः उत्तर भारतात साधूंच्या पलटणी तत्कालीन राजे व नवाबांकडे भाडोत्री सैनिक म्हणून कार्यरत होत्या. अवधचा नवाब, भरतपूरचे जाट राजे, बनारसचे राजे, बुंदेलखंडाचे राजे, मराठा राजे सिंदीया यासारख्या उत्तरेतील बहुतांश सत्ताधाऱ्यांकडे नागा साधूंच्या भाडोत्री पलटणींनी लढायांच्या सेवा बजावल्या. त्याच्या बदल्यात तत्कालीन राजांकडून त्यांना राजकीय तिजोरीतून मोठ्या प्रमाणात तनखा , देणग्या, पेन्शन आणि जमिनींच्या महसूलाचे हक्कही दिले. त्र्यंबकेश्वर येथील एका आखाड्याला तत्कालिन सनदेनुसार निळकंठ महादेव मंदिर, निलांबिका देवी व भोवतालच्या पहाडावरील झाडाझुडपांसह जमिनीचा अधिकार दिला होता. एकट्या त्र्यंबक शहरातील आखाड्यांच्या मालकीची जमीन १८० एकराच्या वर जाते. त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील आखाड्यांच्या शेकडो एकर जमिनीवर आदिवासी कुटुंबे कसत आली आहेत. देवस्थानच्या जमिनी कुळकायद्यातून वगळल्याने त्यांच्या नावावर झाल्या नाहीत. येथे दसऱ्यानंतर पीक आले की आखाड्यावाले बाबा "मक्ता' नेण्यासाठी येत असत. या शोषणाविरोधात श्रमजीवी संघटनेने लढाही दिला. अशाप्रकारे राजाश्रयाच्या माध्यमातून आखाड्यांकडे जमा झालेल्या संपत्तीची वाढ पुन्हा राजाश्रयाच्या माध्यमातूनच द्विगुणीत होत गेली. राजांसाठी लढाया लढता लढता, राजकीय गुरू म्हणून दरबारी स्थानपन्न झालेल्या, आशीर्वादरुपी सल्ला देणारे हे महंत राजांचेही सावकार बनले. पुर्वीपासुन राजे - महाराजांच्या अलिकडील पेशव्यांच्या दरबारातील दरबारी गुरुंनी राजाश्रयाच्या जोरावर अमाप संपत्ती संपादन करून तसेच अनेक गावे इनामी मिळवून भौतिक सुख-समृध्दीची सोय केली होती. विशेष म्हणजे अडचणीच्या वेळी राजे लोकांनाही ते कर्जाऊ रक्कम देण्याची त्यांची क्षमता होती.
  • पुरातन काळापासून धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेत धर्मसत्ता नेहमीच वरचढ राहिलेली आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे सर्वसामान्य जनतेची / भक्तजनांची त्यांचे प्रती धर्म म्हणून असलेली नितांत श्रध्दा. त्यामुळे ही बाब हेरुन राजसत्तेने धर्मसत्तेला नेहमीच या ना त्या मार्गाने खुश ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा इतिहास आहे. दोन्ही बाजुंकडून एकमेकांना पुरक होईल अशाच धोरणांचा पुरस्कार केल्याचे दिसून येते.
  • एकंदरीत चालत आलेल्या या सर्वच घटनांकडे डोळसपणे पाहिले गेले पाहिजे.. केवळ परंपरा आणि श्रध्दा या पलिकडे जाऊन वास्तव काय आहे, हे ही समजून घेतले पाहिजे. देव, दैवी,, शक्ति, नियती, ईश्वर, मोक्ष ,यांच्याकडे थेट पोहचता आले पाहिजे….खरेतर सत्कर्म हाच मोक्षाचा मार्ग आहे…. आणि सत्कर्म म्हणजे काय हे तर माहितच असते आपल्याला !! …ठिक आहे….. तिर्थाटनही झाले पाहिजे. पण आपल्या पाप-पुण्याचा हिशोब कुणाकडून समजून घेण्यापेक्षा तो तटस्थपणे आपणच मांडला पाहिजे आणि त्यावर आत्मचिंतनही केले पाहिजे…अंतर्मनाला प्रश्न विचारुन योग्य काय, अयोग्य काय याचा स्वयंनिर्णय घेतला पाहिजे….. जगण्यासाठी धर्मावर श्रध्दा तर असलीच पाहिजे यात शंकाच नाही पण ती अंधश्रध्येत रुपांतरीत होणार नाही, याची आवर्जून दक्षता घेतली पाहिजे…तारतम्यभाव जपला पाहिजे…. कार्यकारणभाव समजून घेतला पाहिजे….आणि अर्थातच समृद्ध जीवन जगण्यासाठी कर्म करण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय नाही !! कारण कर्म आणि धर्म यांचा संयोग नेहमी होईलच याची काय शाश्वती….. कारण काहीही झाले तरी तो शेवटी कर्मधर्मसंयोगच !!!

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

नर्मदा नदी ज्या ठिकाणी भरोचला समुद्रात मिळते, भरोच येथील त्या ठिकाणास 'भृगु-कच्छ' किंवा 'भृगु-तीर्थ' म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी भृगुऋषी यांचा आश्रम होता. पौराणिक संदर्भानुसार येथेच राजा बळी याने दहा अश्वमेध-यज्ञ केले होते. भरोचच्या दुसऱ्या किनाऱ्यावर समुद्रालागत विमलेश्वर नावाचे तीर्थस्थान आहे.

चित्रस्रोत : गुगल - भृगुऋषी

भृगुकच्छ नावाची जागा आता आधुनिक गुजरातमधील भरोच म्हणून ओळखली जाते. हे पश्चिम भारतातील एक प्रसिद्ध शहर आणि समुद्री बंदर होते. या ठिकाणाला भरुकच्छ, भृगुपूर, भृगुतीर्थ इत्यादी नावे असल्याचे साहित्यात आढळतात. परदेशी लेखक त्याला बेरीगाझा, बैरुगाझा, बारगोसा इ. नावाने पण उल्लेख केल्याचे निदर्शनास येते. पुराणांमध्ये याचे वर्णन महर्षी भृगुऋषीचे क्षेत्र म्हणून करण्यात आला असल्याने भृगुतीर्थक्षेत्र म्हणून पण हे प्रसिद्ध आहे. नाशिकमधील एका शिलालेखावरून असे दिसून येते की, येथे प्रवाशांच्या सोयीसाठी घरे, विहिरी, तलाव कोणी उषावदात याचा जावई नहपान याने बांधली होती.

चित्रस्रोत : गुगल - भृगु ऋषी मंदिर

हे शहर व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात खूप प्रसिद्ध होते. पश्चिम किनाऱ्यावरील हे सर्वात मोठे बंदर होते. इसवी सनाच्या पहिल्या शतकात, उत्तर आणि मध्य भारतातील सर्व आयात-निर्यात याबंदरातुन होत असे. जातक ग्रंथात या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा उल्लेख असल्याचे आढळते. सुप्पारक जातक या ग्रंथात भरुकच्छच्या समुद्री व्यापाऱ्यांच्या साहसी प्रवासाबद्दल मनोरंजक तपशील सापडतात. सुसोदी जातकमध्ये येथील व्यापारी जलमार्गाने सुवर्णभूमीला जात असत, असा उल्लेख आढळतो.

चित्रस्रोत : गुगल - नर्मदा पार्क भरोच

एक परदेशी पर्यटक हुएनसांग पण आपल्या भेटी दरम्यान या बंदराच्या प्रसिद्धीचा उल्लेख करतो. उत्तर भारतातील प्रमुख शहरे भृगुकच्छशी जोडलेली होती. उज्जैनीतून येथे मलमल या कपड्याची व्यापारासाठी आवक असायची. या बंदरातून दक्षिणेतील व्यापारी आपला माल पाश्चिमात्य देशांना पाठवत असत.

हर्षच्या काळात भृगुकच्छ ही गुर्जर घराण्याची राजधानी होती. दक्ष दुसरा हा येथे राज्य करीत होता. हे राज्य बहुधा नर्मदा आणि माही या नद्यांच्या मध्यभागी वसलेले होते.

स्रोत :

प्राचीन इतिहास तथा संस्कृति के प्रमुख स्थल भृगुकच्छ - India Old Days
इस स्थान की पहचान आधुनिक गुजरात के भड़ौच से की जाती है। यह पश्चिमी भारत का प्रसिद्ध नगर एवं समुन्द्री बन्दरगाह था। साहित्य में इसके नाम भरूकच्छ, भृगुपुर, भृगुतीर्थ आदि मिलते है। विदेशी लेखक इसे बेरीगाजा, बैरूगाजा, बैर्गोसा आदि कहते है। पुराणों में इसे महर्षि भृगु का क्षेत्र बताया गया है तथा इसे तीर्थस्थल कहा गया है।

 

Rajendra Joshi साठी प्रोफाइल फोटो

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सरकार महाराष्ट्रात आले, ते पेशव्याचा पराभव करून. त्याआधी त्यांनी छत्रपती, पेशवे, पटवर्धन, शिंदे, होळकर यांना एकमेकापासून बाजूला केले होते. तरीही जनतेकडून बंड होऊ शकते अशी भीती होती.

त्यामुळे पेशवे हे पूर्णपणे नालायक राज्यकर्ते होते - अशी प्रतिमा बनवण्याचे काम त्यांनी हाती घेतले. कंपनी सरकारचे चाकर, कंत्राटदार अशा लोकांकरवी बऱ्याच खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या. घटकंचुकी, गळ्यात-गाडगे-कमरेला-खराटा, अस्पृश्यतेला पेशवे जबाबदार - - वगैरे पुष्कळ थापा मारल्या गेल्या. अशा थापा लोकप्रिय होण्यासाठी घटकंचुकीसारखी आंबटशौकिनांना चघळायला आवडणारी फँटसी उपयोगी पडते. प्रत्यक्षात ही पद्धत युरोपातील आहे. एवढेच नव्हे तर ब्रिटिशांच्या अशा चाकरांनी त्यांची विकृत बुद्धी कामाला लावून - पुण्याच्या रस्त्यात ब्राह्मण स्त्रियांच्या नग्न शर्यती होत - अशी कहाणीही रचली. कल्पनेने दोन तीन स्त्रियांची नावेही लिहून टाकली.

याव्यतिरिक्त लोकमत ब्रिटिशांच्या बाजूचे व्हावे म्हणून एक गोष्ट वारंवार सांगितली गेली. ती म्हणजे - हिंदू धर्म अन्यायी आहे. त्यापासून भारताला सोडवण्यासाठी दयाळू ब्रिटिश देवाने पाठवले आहेत. याच थापेबाजीने आजच्या तथाकथित पुरोगामित्वाचा पाया घातला गेला आहे. म्हणूनच तशी विचारधारा आजही भारताच्या संस्कृतीला हीन लेखण्यात धन्यता मानते.

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

*रघुराजा*

नवरात्र-दसर्‍याच्या काळात शमी आणि आपट्याची पूजा केली जाते. आपट्याची पाने तर सोने म्हणून वाटण्यात आणि लुटण्यात येतात. त्यामागे एक पुराणकथा दडलेली आहे.

रामाचा पुर्वज रघुवंशात पराकोटीचा दानशूर रघुराजा होता. हा रघु राजा अत्यंत पराक्रमी आणि दानशूर होता. त्याचे राज्य आजच्या भारत, पाकिस्तान अफगाणिस्तान आणि मध्य आशियाचा पण त्याच्या राज्याचा भाग होता, एवढे विस्तृत राज्य असल्याचे सांगितले जाते. त्याला कोणाची पण हरविण्याची ताकद नव्हती. तो एवढा दानधर्मी होता की लोक कल्याण हेच एका वैराग्यशील राज्याचे खरी संपत्ती आहे, अशी त्याची ठाम धारणा होती. प्रत्येक युद्ध जिंकून आला की तो यज्ञ करुन दान धर्म करीत असे.

त्याच वेळेस कौत्सा नावाचा एक ब्राह्मण पुत्र त्याच्या राज्यात गुरूकडून शिक्षा घेऊन गुरुदक्षिणा बद्दल विचारू लागला. त्यावेळेस महर्षी म्हणाले, वत्सा, तुझी पुर्ण पार्श्वभूमी मला माहित आहे, तु मला गुरुदक्षिणा देऊ शकणार नाही, तरी माझ्या कडुन मिळालेलं ज्ञानाचा तु जास्तीत प्रसार कर, ते तु सत्कर्मी वापर, म्हणजे तीच माझी गुरुदक्षिणा होईल.

शेवटी कौत्सा एवढे सांगुन पण माघार घेत नाही, कौत्स मागेल तेवढे धन देण्याचे वचन गुरूला देऊन बसला. तेव्हा महर्षीने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा म्हणुन मागितल्या. जर शक्य नसेल तर माझा आशीर्वाद घे आणि आश्रमातुन निघून जाऊ शकतो. आता मात्र कौत्सा गहन विचारात पडला. महर्षी असे काही मागतील असा विचार त्याने कधी पण केला नव्हता.

चित्रस्रोत : गुगल

काही झाले तरी गुरूला गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे, अशी आकांक्षा मनात बाळगुन तो घनदाट जंगलातुन गुरुदक्षिणा मिळविण्यासाठी चालु पडला. त्या घनदाट जंगलातून मार्गक्रमण करीत असतांना तो विचार करू लागला, मला एवढी गुरुदक्षिणा कोण देईल ? कोण एवढा दानशूर आहे? एवढे धन देणारा दानशूर तरी आहे का ? असे विचार करीत असतांना एकदा आश्रमात शिक्षण घेत असतांना, गुरुंच्या मुखातून रघुराजाच्या दानशूरते बद्दल ऐकले होते. ते शब्द त्याला आठवले, आणि रघुराजाच्या राज्याच्या दिशेने चालु लागला. जेव्हा तो राज महालाच्या बाहेर पोहचला, तेव्हा त्याला महालाबाहेर रिकाम्या मडक्या शिवाय दुसरे कोणतेही वैभव दिसत नव्हते. मनोमन तो विचार करू लागला, असा राजा काय देऊ शकणार....!

चित्रस्रोत : गुगल

रघूराजाला दूतांनी माहिती दिली की महालाबाहेर कोणीतरी याचक आपली भेट घेऊ इच्छितो..!

राजाने त्याला आतमध्ये बोलावले. त्याचा आदरपूर्वक पाहुणचार केला. तेव्हा त्याने मला काही सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा द्यायची असल्याने मी आपल्या कडे आलो आहे. तेव्हा राजाने सध्या तरी माझ्या कडे या मातीच्या मडक्याशिवाय दुसरे काही नाही, तरी पण आपल्याला किती सुवर्ण मुद्रा पाहिजे, हे निःसंकोचपणे सांगा, अशी विनंती केली.

त्यावेळेस कौत्साने चौदा कोटी सुवर्णमुद्रा राजाकडे मागितल्या. परंतु त्याच्या राजकोषात तेवढ्या सुवर्णमुद्रा नव्हत्या. याचक परत गेला तर, आतापर्यंत केलेल्या दानधर्माचे पुण्य वाया जाईल, असा विचार रघु राजाच्या मनात आला. यावर पर्याय म्हणुन त्याने देवांचा खजिनदार कुबेरावर स्वारी करण्याचा निश्चय पक्का केला. त्यानुसार सैन्य घेऊन तो उत्तरदिशेला कुबेराच्या अलकावती नगरीकडे मार्ग क्रमण करीत निघाला. रात्र झाल्याने सैन्य नगरी बाहेर एका शमीच्या / आपट्याच्या वृक्षाखाली मुक्काम करण्यासाठी थांबले, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अलकावती नगरीवर स्वारी करण्याचे निश्चित केले.

आपल्या गुप्त हेरांकडून कुबेराला ही खबर बात मिळाली.

कुबेराने आपल्या अंतर्ज्ञाने स्वारी करण्याचा हेतु ओळखला. रघुराजाच्या कीर्तीला ठेच पोहचू नये, म्हणून कुबेराने त्याच रात्री शमी आणि आपट्याच्या झाडांवर प्रचंड प्रमाणात सुवर्णमुद्रांची वृष्टी केली. ही सर्व कुबेराची माया असल्याचे रघुराजाच्या लक्ष्यात यायला वेळ लागला नाही. सैनिकांना सांगितले, आपला हेतु फलित झाल्याने स्वारी करण्याची गरज नाही. त्यामुळे रघुराजाला कौत्साने मागितलेल्या १४ कोटी सुवर्णमुद्रा सहजपणे देता आल्या. त्याशिवाय राहिलेल्या सुवर्णमुद्रा प्रजाजनांना वाटता आल्या. त्यावेळेपासून विजयादशमीला आपट्याची पूजा करून त्याची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली.

रामायणात रामाने याच दिवशी रावणाला ठार करून त्याच्या बंदिवासातून सीतेची मुक्तता केली.

चित्रस्रोत : गुगल

कालीमातेने महिषासुर, शुंभ, निशुंभ, रक्तबीज इत्यादी दैत्यांचा वध करून देवांना विजय मिळवून दिला. या दैत्यांचा वध करणे देवांना शक्य झाले नाही, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकमताने निर्णय घेतला.

चित्रस्रोत : गुगल

त्यांच्या मुखांतून प्रकटलेल्या विद्युतशलाकेतून दिव्य अशी दहा हातांची लावण्यवती अवतरली. देवांनी तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे दिली. ती शस्त्रे घेऊन ही महादेवी दैत्यांवर तुटून पडली. नऊ दिवसपर्यंत वेगवेगळ्या दैत्यांशी तुंबळ युद्ध केले आणि तिने एकेक राक्षसाचा वध केला. महिषासुराचा वध केलेला दिवस तो विजयादशमी.

चित्रस्रोत : गुगल

महाभारतात पांडवांच्या वाट्याला वनवास आणि अज्ञातवास आला. त्या अज्ञातवासात जाण्याअगोदर त्यानी आपली शस्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली. मात्र जेव्हा कौरवसैन्य विराटावर स्वारी करून त्याच्या गायी पळवू लागले तेव्हा विजयादशमीला ढोलीत लपविलेली शस्त्रे काढून त्यांच्या जोरावर अर्जुनाने कौरव सैन्याला पिटाळून लावले आणि विजय संपादन केला.

त्यावेळेपासून शमीवृक्षाला विजय मिळवून देणारी वनस्पती मानण्यात येऊ लागले. तो वृक्ष म्हणजे अपराजिता देवीचे रूप मानले जाते.

स्रोत :-

TRISHANKU
You have reached your viewing limit for this book ( why? ).
गोव्याची नवरात्र आणि दसर्‍याची उत्सव-परंपरा
– डॉ. पांडुरंग फळदेसाई दसर्‍याचा सण म्हणजे तब्बल दहा दिवसांचा उत्सव. एका वेगळ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करावयाचा पर्वकाळ. आपल्या पूर्वजांनी गाजविलेल्या विजयाची आठवण मनीमानसी जागवत स्वकर्तृत्वाला तजेला देण्याचा हा उत्सवकाल असतो. छोट्याशा गोव्यात नवरात्र आणि दसर्‍याचा पर्वकाळ विविधतेने साजरा होतो. मात्र सगळीकडची भावना एक, उत्साह तोच आणि उमेद तेवढ्याच तोलामोलाची. गणेश चतुर्थीच्या सणाला निरोप देता देता गोमंतकीयांना नवरात्र आणि दसर्‍याचे वेध लागतात. अन्य सण एक-दोन दिवसांपुरते मर्यादित असतात. परंतु दसर्‍याचा सण म्हणजे तब्बल दहा दिवसांचा उत्सव. एका वेगळ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करावयाचा पर्वकाळ. आपल्या पूर्वजांनी गाजविलेल्या विजयाची आठवण मनीमानसी जागवत स्वकर्तृत्वाला तजेला देण्याचा हा उत्सवकाल असतो. नवरात्र म्हणजे शक्तिदेवतेच्या आवाहनाचा काळ. या काळाच्या आगमनाची चाहूल निसर्ग तर देतोच, परंतु गोव्यातील मंदिरांच्या प्राकारात एक लगबग सुरू होते. प्राकाराची साफसफाई, रोषणाई, सजावट, मखराला नवा साज, वाद्यसंगीताची सुरावट, भक्तिसंगीताचे सादरीकरण, अहोरात्र चाललेले धार्मिक विधी, नवसपूर्ती, कीर्तनच्या बारी, भाविकांची भाऊगर्दी यांमुळे गोव्याचे ग्रामीण वातावरण पार बदलून जाते. संपूर्ण वातावरणात भाविकता आणि आध्यात्मिकतेचे पावित्र्य भरून राहिलेले दिसते. छोट्याशा गोव्यात नवरात्र आणि दसर्‍याचा पर्वकाळ विविधतेने साजरा होतो. मात्र सगळीकडची भावना एक, उत्साह तोच आणि उमेद तेवढ्याच तोलामोलाची. आपल्या दसर्‍याला भारतीय संस्कृतीने एक आनंददायी सण मानला आहे. म्हणूनच आपण दसर्‍याचा उल्लेख ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असा करतो. भारतीय संस्कृतीने या सणाला ‘विजयादशमी’ हे एक अर्थपूर्ण नाव बहाल केले आहे. विजयादशमी हा विजयाची आठवण करून देणारा दिवस. हा विजय कोणता? आपल्या पूर्वजांनी शत्रूंवर संपादन केलेला विजय. दुष्ट वृत्तीवर सुष्ट वृत्तीने मिळविलेला, वाईटावर चांगल्याने मात केलेला, असत्यावर सत्याने मिळविलेला विजय. त्या विजयाचे भान आपण आपल्यात जागवायचे असते. आपणच आपल्यात डोकावून आपल्यातील वाईट गोष्टींचे दमन करावयाचा हा दिवस. आमच्या कल्पक पूर्वजांनी माणसामधली माणुसकी जागविण्यासाठी वेगवेगळ्या व्रत-उत्सवांची योजना केली. माणसाच्या दैनंदिन व्यवहारातील माणुसकीचा ओलावा कायम टिकून राहावा म्हणून त्यांनी हा सगळा उपद्व्याप केला. आपल्या विविध व्रत-उत्सवांमधून त्यानी मानवी आयुष्याला विविध स्वरूपाचे नवनवे आयाम दिले आणि मानवतेची गुढी नेहमी उंचावर फडकत ठेवण्याची तजवीज केली. विजयादशमी म्हणजे दसरा हा त्यापैकीच एक उत्सव. असुर वृत्तीवर, असत्यावर, वाईट गोष्टींवर विजय मिळविलेला आणि सांप्रतच्या आयुष्यात विजय मिळविण्याची प्रेरणा देणारा हा दिवस. रामायणात रामाने याच दिवशी रावणाला ठार करून त्याच्या बंदिवासातून सीतेची मुक्तता केली. कालीमातेने महिषासुर, शुंभ, निशुंभ, रक्तबीज इत्यादी दैत्यांचा वध करून देवांना विजय मिळवून दिला. या दैत्यांचा वध करणे देवांना शक्य झाले नाही, तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी एकमताने निर्णय घेतला. त्यांच्या मुखांतून प्रकटलेल्या विद्युतशलाकेतून दिव्य अशी दहा हातांची लावण्यवती अवतरली. देवांनी तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे दिली. ती शस्त्रे घेऊन ही महादेवी दैत्यांवर तुटून पडली. नऊ दिवसपर्यंत वेगवेगळ्या दैत्यांशी तुंबळ युद्ध केले आणि तिने एकेक राक्षसाचा वध केला. महिषासुराचा वध केलेला दिवस तो विजयादशमी. महाभारतात पांडवांच्या वाट्याला वनवास आणि अज्ञातवास आला. त्या अज्ञातवासा

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

झाशीच्या राणीला स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणारी धनगर राणी भीमाबाई होळकर असल्या तरी इंदौरमध्ये इंग्रज सैन्याची

छावणी भीमाबाईने पडू दिली नाही. भीमाबाईच्या शौर्य पराक्रमाची किर्ती भारतभर झाली आणि १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात पाठीवर मुल बांधून रणांगणात उतरण्याची प्रेरणा झाशीची राणी लक्ष्मीबाईला भीमाबाईकडून मिळाली.

भीमाबाईंचा जन्म १७ सप्टेंबर १७९५ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खून केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला की नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ ऑक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करून शिंदे व पेशव्यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर झाली.

तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षणाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. ब्रिटिश विदुषी मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घटना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वतः शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोणी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करून महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरून रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.

भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरू केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अस्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या.

इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे.

त्यांनी इंग्रजी तळांना अचानक हल्ले करून लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करून घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पडला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले.

भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे २८ नोव्हेंबर १८५८ मध्ये भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले.

स्त्रोत :

महान भारतीय क्रांतीकारक धाडसी योद्धा भीमाबाई होळकर | Discover Maharashtra

भीमाबाई होळकर - विकिपीडिया

 

एकनाथ वाघ साठी प्रोफाइल फोटो

'असईची लढाई'

असई लढाई ही आपल्या पूर्वजांनी गाजवलेले शौर्य अधोरेखित करणारी आहे. भारतीयांच्या दृष्टीने या लढाईचे महत्त्व म्हणजे मराठे ही लढाई प्रादेशिक वर्चस्वासाठी नाही, तर परकीयांचे वर्चस्व व मुजोरी उखडून फेकण्यासाठी लढत होते. मराठवाड्यात इतिहासाच्या अशा अनेक पाऊलखुणा आहेत, पण कधी इतिहासाच्या पुस्तकांतून सर्वसामान्यांपर्यंत ही सगळी माहिती जात नाही.

23 सप्टेंबर 1803 ची दुपार. जालना जिल्ह्यातील पूर्णापूर (जाफ्राबाद) तालुक्यातील असई गावाचा परिसर. एका बाजूला केळणा, तर दुसर्‍या बाजूला जुई नदी भरून वाहताहेत. असईच्या पुढे या दोन्ही नद्यांचा संगम. मागे दोआबात घनघोर लढाई चाललेली. इंग्रज आणि मराठे यांच्यातील हे युद्ध ‘असईची लढाई’ नावाने ओळखले जाते. या युद्धात इंग्रजांचा लेफ्टनंट कर्नल पॅट्रीक मॅक्सवेल हा कामी आला. याची कबर बांधली असुन तेथे त्याचे नातेवाईक आज पण भेट देण्यासाठी येतात.

दुसऱ्या बाजीरावाचा होळकरांनी ऑक्टोबर २५, १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभव केला. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली. हा तह वसईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले.

मराठ्यांचे नेतृत्व शिंद्या कडे होते तर इंग्रजाचे नेतृत्व आर्थर वेलस्ली याने केले.

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेलेले होते. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्यांच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले.

इंग्रजांनी युद्धात उतरायचे ठरवल्या वर त्यांना मराठ्यावर आक्रमण करणे भाग होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम नागपूरच्या भोसल्यांवर प्रथम आक्रमण करावयाचे ठरवले. शिंद्यानी पण आपली सेना शत्रूला शक्यतो लवकर संपवावे यासाठी भोसल्यांच्या मदतीला आणली. मराठे व इंग्रज हे दोन्ही फौजा चांगले स्थळ व वेळेच्या शोधात होत्या.

मराठ्याचे ४०-५० हजार नियमित सैनिक होते व बराच मोठा तोफखाना होता. मोठे संख्याबळ व तोफखान्याच्या जोरावर इंग्रजांवर मात करु असा विश्वास मराठ्यांच्या सरदारांना होता तर वेलस्लीला त्याच्या शिस्त बद्द इंग्रज लष्करावर विश्वास होता. इंग्रज मराठ्याच्या फौजेला गाठून हरवायच्या बेतात होती तर मराठ्याना अजूनही पारंपारिक गनिमी काव्याच्या पद्धतीवर विश्वास होता.

इंग्रजांचे सैन्य दोन मुख्य पलटणीत विभागले होते. एक पलटण घेऊन कर्नल स्टीवनसनने पश्विमेकडून चाल केली तर वेलस्लीने दुसरी पलटण घेउन दुसऱ्या बाजूने चाल करायचे व दोन्ही बाजूंनी मराठ्यांना गाठून कोंडीत पकडायचे ठरविले. परंतु वेलस्लीला मराठ्यांची गाठ लवकर पडली. सप्टेंबर २३ १८०३ रोजी दोन्ही सेना आमने सामने आल्या.

मराठ्यांची सेना केळणा व जुई नदीच्या संगमापाशी स्थित होती. मराठे सेनापतींच्या अंदाजानुसार वेलस्लीला नदी ओलांडावी लागेल व त्याचा फायदा आपण घेऊ असा विश्वास होता. युद्धनीतीच्या दृष्टीने मराठे स्थिती वरचढ होती. वेलस्लीकडे सेना कमी होती तसेच कुमक येण्यासाठी अजून काही दिवस वाट पहावी लागली असती. परंतु वेलस्लीने आक्रमणाचा निर्णय घेतला. त्याने कैतना नदीच्या कडे कडेने नदी कुठे पार करता येईल याचा अंदाज घेतला.

स्थानिक वाटाड्यांनुसार जवळ कुठेही नदी उथळ नव्हती, परंतु आष्टीजवळ त्याला उथळ जागा सापडली. परंतु मराठ्यांनीपण वेलस्लीचे भारतीयांबाबतीत शिस्तीचे अंदाज चुकवले, वेलस्लीच्या फौजेला मराठ्याशी आमने सामने युद्ध करावे लागले. त्यामुळे ब्रिटीश फौजही अंदाजापेक्षा जास्त मारली गेली परंतु ७४ व्या व ७८ व्या हायलॅंडर तुकडीने मराठ्यांच्या सेनेचे कंबरडे मोडून काढले मराठ्यांची सेनेने पळ काढला. साधारणपणे ६००० मराठे सैनिक कामी आले. ब्रिटीशांचे १५०० सैनिक मारले गेले. वेलस्लीच्या वेलस्लीच्या मते त्याच्या कारकिर्दीतील त्याने लढलेले सर्वोत्तम युद्द होय.

मराठ्यांचे संख्याबळ अधिक असूनही मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांचे १,२०० जण ठार झाले तर इंग्रजांचे ४२८ जण. इंग्रजांची उच्च दर्जाची शस्त्रे व युद्धपद्धती यात कितीतरी पटीने इंग्रज वरचढ होते. तसेच मराठ्यांचे गनीमी काव्याचे तंत्र युरोपीयन आमने सामनेच्या युद्धतंत्रापुढे काम करु शकले नाही. मराठ्यांच्याकडे महादजी शिंद्यानंतर त्यांच्या तोडीचा सेनापती नव्हता त्याचे नुकसान मराठ्यांना झाले.

पालखेडच्या लढाईत पहिले बाजीराव यांनी मराठा साम्राज्याचा पाया भक्कम केला होता, ते एक अद्वितीय युद्ध म्हणून इतिहासाच्या पानावर कोरले गेले आहे.. या युद्धामुळे मात्र मराठा साम्राज्य संपुष्टात येऊन मराठी सत्तेस उतरती कळा लागली आणि इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानात दृढमूल झाली.

स्त्रोत :

मराठवाड्यातील इतिहासाच्या पाऊलखुणा

इतिहास बदलवणारी असईची लढाई

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...