आपली संस्कृती म्हणजे पौराणिक आणि प्राचीन शिल्पकला, वास्तुकला आणि कला कौशल्याचे भांडार आहे. आजच्या विज्ञान युगात आणि पुरोगामी विचारसरणीची मुळ आपल्या मनात एवढी खोलवर रुजली आहे की, आपल्याला आज विज्ञान युगात पण काही गोष्टी अशक्य आहेत, जे प्राचीन काळी अत्यंत कला कौशल्याने साकार केले, त्यावर आपले पुरोगामी विचार अभ्यास आणि निष्कर्ष काढण्यासाठी कमी पडतात. कालाच्या ओघात या शिल्पकला दुर्लक्षित झाल्याने त्यांची पडझड झाली असली तरी त्यांचे महत्व मात्र कमी होऊ शकत नाही. आज त्यांच्यामुळे पौराणिक वारसा, आणि सांस्कृतिक अभिमान जोपासला जात आहे. एकेकाळी मराठी सत्तेचा कारभार पाहणारे बहुतांशी किल्ले तर अगदी शेवटची घटका मोजत आहेत. यापैकी काही तर नामशेष झालेसुद्धा..! अस्तित्व संपलेल्या या किल्ल्यांना अक्षरश: कागदातूनच शोधावे लागणार आहे यात शंका नाही. असाच एक इतिहासकालीन पुण्याजवळील किल्ला पूर्णत: नामशेष झाला असून हा किल्ला आता केवळ डोंगर म्हणनूच उभा आहे. दौलतमंगळ असं याचं देखणं नाव! हा दौलतमंगळ अक्षरश: शेवटची घटका मोजत कसाबसा उभा आहे. या किल्ल्याच्या बाबतीत समाधानाची एकच गोष्ट म्हणजे या किल्ल्यात असलेलं एक प्राचीन आणि तितकंच सुंदर शिवमंदिर अजूनही तग धरून आहे. म्हणूनच या डोंगरावर अनेक शिवभक्त शंकराच्या पिंडीच्या दर्शनासाठी येत असतात, पण बहुतेकांना येथेच एक किल्ला होता असे म्हटले तरी पटणार नाही, इतकं भीषण वास्तव या किल्ल्याच्या बाबतीत इथं घडलंय. ब-याचदा फिरायला जायचे कोठे, त्याचे अंतर किती अशा प्रश्नांचा गुंता सोडवता-सोडवता आपले भटकणे राहून जाते. आणि काहीच नाही यापेक्षा काहीतरी-कोठेतरी फिरूच म्हणून गजबजलेली ठिकाणे पाहिली जातात. म्हणूनच आपल्या इतिहासाचा जर अभ्यास आणि वाचन केले तर काही सुंदर नावे नक्कीच आपल्या समोर येतील. दौलतमंगळचा डोंगर हे याच पंक्तीत भर घालणारं नाव आहे.सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले सर्वज्ञात असेच एक स्थळ, म्हणजे भुलेश्वर मंदिर होय. पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. भुलेश्वरचे मंदिर पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ आहे. ते मंदिर दौलतमंगल या किल्ल्यामध्ये सामावलेले आहे. पुणे शहराच्या दक्षिणेकडे असलेली सह्याद्री पर्वताची उपरांग ‘भुलेश्वरची रांग’ म्हणून ओळखली जाते. ती रांग पूर्व-पश्चिम अशी पसरलेली आहे. त्या रांगेत सिंहगड आणि मल्हारगड यांच्या सोबतीने दौलतमंगल किल्ला उभा आहे. त्या किल्ल्याचे काही बुरूज आणि प्रवेशद्वार वगळता केवळ भग्नावशेष उरले आहेत.
दौलतमंगल किल्ला :-
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला सुरुवात केल्यावर राजमाता जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांच्या बरोबर शिवरायांच्या प्रथम पुणे भेटीचा प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो.इ.स.१६३६ मध्ये शिवरायांनी जेव्हा पुण्यात प्रवेश केला त्यावेळी त्यांना विजापूरकर आदिलशाही फौजेने सहा वर्षांपूर्वी पुण्याचा केलेला विध्वंस बघायला मिळाला.इ.स.१६३० च्या पावसाळ्यात शहाजहान बादशाहच्या मदतीस धावलेल्या आदिलशाहने मुरार जगदेव,रणदुल्लाखान.कान्होजी जेधे, राया राव वगैरे सरदाराना शहाजी राजांच्या जहागिरीवर विजापुरी फौजेसह रवाना केले होते. त्यावेळी मोगल( शहाजहान ) व निजामशाही यांतील संघर्षात शहाजी राजे निजामशहा च्या बाजूने होते तर आदिलशाह मोगलांच्या बाजूने होता. मुरार जगदेवाने ‘ पुणे कसबा वस्ती जाळून गाढवाचा नांगर पांढरीवर ( नागरी वस्तीवर )धरिला.पुण्याचा कोट पाडून शाहजीचे वाडे जाळिले व लुट केली;आणि भुलेश्वराच्या डोंगरावर दौलत मंगळ किल्ला बांधून तेथून पुणे परगण्याचा कारभार आदिलशाह कडून चालावा अशी व्यवस्था ठरविली.’ तसेच रस्त्यावर जमिनीत एक लोखंडी पहार ठोकून तिच्यावर फाटक्या तुटक्या वहाणांचे आणि जोड्यांचे तोरण टांगले ज्यातून ध्वनित करावयाचे होते कि आता हे गाव बरबाद करण्यात आले असून पुन्हा ते कुणी आबाद करण्याचा प्रयत्न करू नये,तसे केल्यास तो शाही अपराध समजला जाईल. आदिलशाही फौजांनी विद्रूप केलेल्या पुण्याचा चेहरा मोहरा बदलुन पुन्हा पूर्वीच्या वैभवशाली पुण्याच्या पुनर्निर्मितीसाठी जिजामाता व दादोजी कोंडदेवांनी विविध उपाय योजना करून पुण्याला पूर्वीची शान प्राप्त करून दिली. त्याचा श्रीगणेशा गाढवाचा नांगर फिरवलेल्या पांढरीत अस्सल सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने जमीन नांगरून करण्यात आला होता.
अशा रीतीने आपल्याला मुरार जगदेवांचे नाव माहित पडते.हे मुरार जगदेव कोण,कुठले होते,त्यांची मराठ्यांच्या इतिहासात दखल घेण्यासारखे कुठले कार्य,कामगिरी बजावली होती, ( सुरुवातीस नमूद केलेले पुणे विध्वंसाचे कृत्य सोडून ) , मुरार जगदेव यांच्या विषयी मिळालेली माहिती आपण पाहुया. मुरार जगदेव यांचे मूळ गाव धोम ( सातारा ) हे होते.आपल्या कुशाग्र बुद्धी व स्वामी निष्ठेच्या जोरावर ते आदिलशाहीत वजीर समतुल्य अधिकार,प्रतिष्ठा असलेल्या पदावर जवळपास पंचवीस वर्षे टिकून राहिले.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे असून त्यांना आदिलशाहने ‘ महाराज राजाधिराज ‘ ह्या पदवीने गौरविले होते..ऐतिहासिक लिखाणात त्यांचा मुरारी पंडित,मुरार पंडीत ह्या नावांनी पण उल्लेख केलेला आढळतो. मुरार जगदेव यांचे विजापूर दरबारात अनन्य साधारण महत्व होते.पण ते हिंदू व धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांना विजापूर दरबारात छुपे शत्रू पण बरेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.१६३० मध्ये झाला.तेव्हा शहाजी राजे आपल्या आयुष्यातील अत्यंत अस्थिर राजकीय वाटचाल करत होते.मलिक अंबरचा मृत्यू,मुर्तजा निजामशहा ने लखोजी जाधव ( जिजामाता यांचे वडील ),त्यांचे दोन पुत्र अचलोजी व रघुजी,नातू यशवंतराव यांची भेटीस बोलावून विश्वासघाताने केलेली हत्त्या,शहाजहान च्या प्रबळ फौजांकडून निजामशहावर होत असलेली आक्रमणे,तात्कालिक स्वार्थासाठी आदिलशहा च्या नेहमी बदलणाऱ्या भूमिका,निजामशाहीतील अंतर्गत हेवेदावे,वगैरे कारणांमुळे शहाजी राजांचे चित्त पण कुठे स्थिर होत नव्हते.त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द निजामशाही, ( अहमदनगरची,हैदराबाद निजामशाहीशी काही संबंध नाही.)आदिलशाही,निजामशाही,मोगल,निजामशाही ह्या विविध शाह्यांमध्ये गेली.शहाजी राजांच्या आदिलशाहीतील प्रवेश व तेथील दरबारी राजकारणात टिकाव लागण्यामागे मुरार जगदेव यांची मोठी भूमिका होती. या संबंधात जेधे शकावलीत म्हटले आहे कि,’ शके १५५८ शहाजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी ईदलशहाकडून झाली.सरंजामास मुलुख दिल्हे त्यात पुणे देश राजांकडे दिल्हा.त्यांनी आपले तर्फेने दादाजी कोंडदेउ मलठणकर यांसी सुभा सांगून पुणीयास ठाणे घातले,तेव्हा सोन्याह नांगर पांढरीवर धरिला,शांती केली....’ कालौघात मुरार जगदेव आणि शहाजी राजे यांचे सख्य,मैत्री इतकी वाढली कि मुरार जगदेवानी पुणे जाळल्याच्या घटनेचे शल्य विसरून शहाजी राजे मुरार जगदेवांच्या तुलाविधीस स्वतः जातीने हजर राहिले.भाद्रपद वद्य अमावस्येच्या दिवशी—२३ सप्टेंबर १६३३—सूर्यग्रहण होते.या दिवशी पुण्यापासून दहा कोस अंतरावरील भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या नागरगावी सोने,रूपे,धान्य आदी चोवीस पदार्थांनी मुरार जगदेवांची तुला करण्यात आली.( एका पदार्थाने एकदा,म्हणजे एकूण चोवीस वेळा.) अल्लाउद्दिन खिलजीने हिंदू धर्मीय यादवांचे राज्य बुडविल्या नंतर च्या तीनशे वर्षांत वेद्घोषात झालेला हा पहिला तुलाविधी होता.ह्या तुला विधीमुळे नागरगाव चे नवीन नांव ‘ तुळापुर ‘ झाले. नागरगाव इथे तुला करण्याचे एक कारण असे पण सांगितले जाते कि मुरार जगदेवांच्या अंगावर कुष्ठ उठले होते ज्यामुळे ते फार दुःखी झाले होते.नागरगाव इथे रुद्रनाथ नावाचे सत्पुरुष होते.त्यांच्या दर्शनाने व भीमा इंद्रायणी नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने त्यांचे दुखणे बरे झाले.त्या प्रीत्यर्थ मुरार जग्देवानी त्या ठिकाणी संगमेश्वर म्हणून देवालय बांधले. शहाजी राजे,मुरार जगदेव,रणदुल्लाखान,व अन्य आदिलशाही सरदारांनी उत्तरेकडून शहाजहान पुत्र शुजा,दस्तुरखुद्द मोगल सेनापती महाबतखान यांच्या नेतृत्वाखाली चालून आलेल्या मोगली फौजांची परीन्ड्याच्या आजूबाजूस कोंडी करून त्यांची रसद तोडून त्यांना दाती त्रूण धरून शरण येण्यास भाग पाडले.विजयाची आठवण म्हणून मुरार जग्देवानी जगप्रसिद्ध मुलुख मैदान तोफ जिचे वजन ५५ टन होते व अहमदनगर इथे निजामशाहीत ओतली ( बनवली ) गेली होती,विजापूरला नेली.त्यासाठी ४०० बैल,१० हत्ती तसेच शेकडो सैनिकांचा उपयोग करावा लागला.भीमा नदीतून नेताना तिची नावच बुडाली,जी पुन्हा बाहेर काढण्यासाठी अतोनात कष्ट,मेहनत घ्यावी लागली.अखेरीस २९ सप्टेंबर १६३२ रोजी हे प्रचंड धूड विजापुरात पोहचले. ‘ धूळधाण ‘ नावाची अजून एक अवजड तोफ मुरार जग्देवानी मुलुख मैदान तोफेबरोबर विजापूरला नेण्याचे प्रयत्न केले पण तोफ वाहून नेणारा तराफा भीमा नदीत बुडाल्याने धूळधाण तोफेस पण जलसमाधी मिळाली व काढता आली नाही. आदिलशाहीची प्रदीर्घ सेवा करूनही मुरार जगदेवांचा शेवट मात्र फारच करुणास्पद झाला.विजापूर दरबारात खवासखान म्हणून वजीर होता.त्याचे व आदिलशहाचे काही कारणांवरून संबंध बिघडले.मुरार जगदेव व खवासखान एक विचाराने,एक दिलाने काम करणारी जोडी होती.खवास्खानाने इ.स.१६३५ मध्ये शहाजहानकडे गुप्त रीतीने वकील पाठवून शहाजहानला मोगली फौजा विजापूरवर धाडण्याचा सल्ला दिला. त्या फौजेस लागणारी मदत आपण करू जेणेकरून विजापूर राज्य मोगलांना जिंकता येयील असा भरोसा पण िला.खवासखानाच्या हालचाली विजापूरचा सुलतान महमद शहा यास कळल्यावर त्याने प्रथम खवासखानाची हत्त्या केली.( ऑक्टोबर १६३५ ).त्यानंतर एक महिन्याने मुरार जगदेवाना पण कैद करून,त्यांची जीभ छाटून,हात पाय मोडून विजापूर शहरातून धिंड काढून त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले. अशा तऱ्हेने एका कर्तृत्वशाली व्यक्तीचा शोचनीय शेवट झाला.सत्तेच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सेवाकाळात घेतलेल्या भूमिकांमुळे अशा व्यक्तींना प्रसंगी प्राणास हि मुकावे लागल्याची भरपूर उदाहरणे इतिहासात सापडतात. अशा या मुरार जगदेवांनी आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन दौलतमंगळ किल्लाची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता. मुरार जगदेवांची १६३५ मधे आदिलशहाने हत्या केली. मुरार जगदेवाच्या मृत्यू नंतर सुद्धा पुणे प्रांताचा कारभार काही वर्षे दौलतमंगळ वरूनच सुरू होता. मात्र नंतर शिवछत्रपतींनी पुण्यावरून सोन्याचा नांगर फिरवला आणि पुणे पुन्हा उभे राहू लागले. तेव्हा पुन्हा संपूर्ण कारभार पुण्यातून बघण्यास सुरुवात झाली आणि या किल्ल्याला फारसे महत्त्व राहिले नाही. नंतरच्या काळात काही हल्ल्यांमध्ये किल्ला संपूर्ण नेस्तनाबूत झाला. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून बाजूचा बुरूज तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर यादवकालीन-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे. टेकाडावर मूळ भुलेश्वर मंदिराव्यतिरिक्त फार थोड्या वास्तू आहेत.
भुलेश्वर किंवा दौलतमंगळकडे डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. दौलतमंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्याकडे निघालो कि एक डोंगर आपल्यासमोर ठाण मांडून उभा असतो. हा डोंगर जसजसा जवळ करू लागतो, तसतसं या डोंगराचा पडदा बाजूला होऊ लागतो. समोर येणारे बुरूज, दर्गा, तटबंदीचे अवशेष, पायरीमार्ग हे समोर येऊ लागतात. अन् मग आपल्या लक्षात येऊ लागते की, येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता.हा गड इतिहासात काही प्रसिद्ध पावला नाही किंवा यावर काही घडामोडीही घडल्या नाहीत. पण हा किल्ला आपल्या उदासीनतेचं आणि दुर्लक्षतेचं एक गंभीर उदाहरण आहे. कारण हा किल्ला आता पूर्णपणे नामशेष झाला आहे. याची खंत कोणालाच नाही.
आता फक्त तीन ढासळलेले बुरुज काय ते शिल्लक आहेत. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते.
पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते.
पायथ्याकडून निघालो कि सर्वप्रथम हे कोरीव टाके दिसते.
किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
किल्ल्याचे हेच ते प्रवेशद्वार...देऊळ गाठायचा आधी डाव्या बाजूला हे द्वार लागते, ज्याला काही महत्व नाही. ना तिथे खोल्या आहेत ना पलीकडे कोणते महत्वाचे ठिकाण. पण ते आहे देखणे
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
दारातून प्रवेश केला की काही पावलांवर किल्ल्याचा बेसाल्ट दगडात उभारलेला मुख्य दरवाजा दिसतो
वाहनाने गेल्यास वाहने मंदिराच्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. इथे थोडेफार किरकोळ खाण्याचे पदार्थ मिळतात. गाडीच्या पार्किंगसाठी २०/- ते ४०/- असे अल्प दर घेतले जातात.
अजून काही पायऱ्या चढल्यावर दिसला तो मंदिराचा सुंदर परिसर..
अष्टकोनी – हा गडाचा तिसरा बुरुज
याचे अवशेष पार करत आपण डोंगरावर आलो की मग भुलेश्वरचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर घेऊन उभं असल्यासारखं वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसंजसं जवळ येऊ तसंतसं अधिकच खुलतंय असं वाटू लागतं. आता येथून सुरु होतो ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण. कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो कि पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडते. निव्वळ शब्दातीत.भुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केले आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली, म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते.महिनाभर यात्रा असते. परिसरातून मानाच्या कावडी येतात. चैत्री बारशीलाही मंदिरासमोर मानाच्या कावडी नाचवल्या जातात. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात.परंतु पत्रकार कवी यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे.
भुलेश्वरचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारले आहे. पठारावर वाहने उभी करण्यासाठी भरपूर जागा असून, मंदिराच्या मागच्या बाजूस दूरसंचार विभागाचा मनोरा आहे.मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच द्वारपाल जय-विजय, पायऱ्यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आले आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी पाय-यांजवळ असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. मूर्तींच्या शरिरावरील दागिन्यांचे कोरीवकाम आकर्षक आहे. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करत आहे असे शिल्प कोरलेले आहे.
प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प.
पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प. या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.
ऐरावातावळ
हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.
हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.
हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. भुलेश्वरचे मुख्य मंदिर भव्य असून ते एका पठारावर उभारले आहे. मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते. भुलेश्वराचे मूळ मंदिर एका भव्य प्रकारात चौथऱ्यावर तारकाकृती विधानात बांधले असून प्रकाराला दक्षिण व पूर्वेकडून दोन द्वारे आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून नागर शैलीत बांधलेले आहे. मंदिर गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि नंदीमंडप असे चार भागात विभागेले आहे.यादव साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर मुस्लिमांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही त्या काळात नुकसान झाले.
राम मंदीर
भुलेश्वरच्या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आणि पाकळ्यासदृश्य आहे. इतर यादवकालीन मंदिरांच्या तुलनेत भुलेश्वर मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या त्या मंदिराच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा त्या मंदिराचा परिसर आहे. तेथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराच्या गाभा-यात शिवलिंग आहे. मंदिराच्या सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. मंदिराच्या पीठावर गज, अश्व, नर असा कोणताही सांकेतिक थर नाही; परंतु हंस, लतावेल, मकर, कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात.
मुळ मंदिर कसे होते याचे रेखाचित्र
कालांतराने ते मोठे होत गेले व त्याच्या बाजूला बांधकाम वाढत गेले व चौथारा बांधला गेला शेवटी पेशवे काळात देवळाभोवती उंच भिंत बांधली गेली.
मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.याचे टप्पे वरील रेखाचित्रात दाखवले आहेत, यावरुन मंदीराच्या स्थापत्यात कसे बदल झाले हे समजून येईल.
मंदिराच्या प्रांगणात एकीकडे आहे चतुष्की. हीचा उपयोग यज्ञ किंवा दीक्षा देण्यासाठी होत असावा.
तर मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आहे ही भलीमोठी घंटा...
मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवर आहे. फरसबंद आवाराजवळ आणखीन एक मंदिर आहे.
घुमट नं. १ – भुलेश्वर देऊळाचा प्रत्येक घुमट लक्ष वेधणारा
घुमट नं २ – न रंगवलेली करामात
घुमट नं ३
मंदिरात काही मॅथुन शिल्पं ही असावीत्,त्यातली काही पुन्हा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे मुळ मंदिर संपुर्ण दगडी आहे, तर बाहेर्च्या बाजुला पेशव्यांनी या मंदिराचा मातीच्या बांधकामांत जिर्णोद्धार केलेला आहे.
कामशिल्प – जाता जाता देवळाच्या एकदम बाहेरच्या भिंतीवर हे लावलेले दिसले. आता इतक्या वर चढून कोण ते बघणार आहे, ती खिडकी थोडीच आहे ही ख्रिस्ती लोकांच्या gargoyle सारखे दिसणारी आकृती चक्क भुलेश्वर देवळाच्या एका शिखरावर होती
हा पोट फाडणारा सुंदररीत्या कातरलेला नरसिंह ही एका मुसलमानांची आकृतीही हिंदू देवतांच्या खांद्याला खांदा लावून उभी दिसते. नरसिंहाच्या बाजूलाच देवी आणि गणपती लपा छपी खेळताना दिसतात
हा तो सुंदर खांब ज्यात अनेक देवतांनी घर केले आहे
शिखरावर असलेल्या इतर मुर्ती
बहुदा MTDC ने उभारलेली विश्राम छत्री दिसते
मशीदीची भिंत
मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष
वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात.
भूलेश्वर देऊळ बाहेरून साधारण वाटले तरी हे पेशवेकालीन बांधकामही खूप काही
सांगून जाते. जसे की याची रचना इस्लामिक वास्तूची आहे कारण इथे मिनार
दिसतात. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतरच्या काळात बांधले असावे.
शिखरावर अनेक पौराणिक प्रसंग, देवादिकांच्या मूर्ती आणि विष्णूचे दशावतार
कोरलेले आहेत. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव तेथील काही
शिल्पांवर ठळक रीत्या आढळतो.
मंदिराच्या
डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या
असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे
फेडते. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली
दिसून येते.
मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक
घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे.
त्याबाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी
वास्तू ( कोठार) आहे.
समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे. त्याच
दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात
येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास एक तास लागतो. मंदिरा
जवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते.
हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार...अतिशय साधे ...वाकून जावे इतके छोटे....
दरवाज्याकडे तोंड करून आहे हे कासवाची प्रतिमा...कासवासारख्या धीम्या शारीरिक आणि मानसिक गतीने मंदिरात प्रवेश करावा असेच जणू सांगण्यासाठी . दरवाजाच्या पायरीजवळ आहे रंगशीला...त्यावर दोन्ही बाजूला कोरले आहेत दोन कीर्तिमुख...
किंचित झुकत दरवाज्यातून आत गेल्यावर लागते दोन्ही बाजूला सुरेख नक्षी
असलेले किंचित बसके अजून एक द्वार......ह्या द्वारावर पाच पट्ट्या
कोरलेल्या आहेत...डावीकडून त्यांची नावे आहेत, व्यालशाखा, पत्रशाखा, स्तंभशाखा, नर अथवा मानवशाखा आणि पुन्हा पत्रशाखा...
आणि द्वारावर आहे ललाटबिंब...
दरवाज्यातून समोरच दर्शन देते ती हनुमान प्रतिमा...
हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह.
नगारखाना
या दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या सहाय्याने हवा खेळती ठेवली
आहे. शिवाय आतील बाजूस उतुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा ऐन
उन्हाळ्यातही टिकून असतो. हा सभामंडप मुख्य मंदिरापासून वेगळा करणारी आडवी
भिंत आत आहे. अश्या आद्य भिंतीची रचना डोंगरी किल्ल्यावर आत येणाऱ्या
शत्रूला चकवा देण्यासाठी केलेली असते. या आडव्या भिंतीमुळे पुढचा मार्ग
दिसत नसल्यामुळे नवखा माणूस गोंधळून जातो. यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो.
पण काळजीपूर्वक बघितल्यास याच
अंधारी भागात डाव्या-उजव्या बाजूला वर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसतात.
पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. मुख्य मंदिरात
प्रवेश केल्यानंतर काय बघायचे आणि काय नाही बघायचे अशी आपली अवस्था होते.
या मंदिरात आपल्याला कोरीव कामाशिवाय काहीही दिसत नाही. मंदिरात एकही कोपरा
किंवा भिंत कलाकृतीशिवाय दिसणार नाही.
उजवीकडून काही दगडी पायऱ्या चढून गेल्यावर दिसते ते चकित करणारे मंदिराच्या सभामंडपातील शिल्पवैभव! हो वैभवच ते...नक्षीदार असंख्य स्तंभांनी आणि शिल्पांनी नटलेले आणि मढलेले सभामंडप........हे शिल्पवैभव मोहून टाकणे, मतीगुंग करणारे ....ह्या मोहजलातून बाहेर येतो तो भुलेश्वर अर्थात शिवाचे दर्शन घेण्यासाठी.....
मंदिरात आत गेल्या गेल्या जी ओसरी आहे हे तिचं छत.
मंदिरात प्रवेश केला कि एकदम आपण यादवकाळात जातो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो. या मंदिरात प्रवेश करताक्षणीच लाजवाब, भारी, खूपच सुंदर..असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते.
गर्भगृहाकडे जाताना सर्वप्रथम नजर खिळवून राहते ती सभामंडपातील अत्यंत सुरेख, सुबक, आकर्षक, अवाढव्य नंदिशिल्पाकडे!
सूर्यकिरणांचा अभिषेक थेट शिवपिंडीवर व्हावा म्हणून नंदीने आपले मुख किंचित
वळवले ! कथा हे सांगते. पण त्यामागचा भावार्थ आपण घेऊ तसा..शिवपिंड आणि
रविकिरण यांच्या मधे येणारा मी कोण? किती ही उदात्त भावना....
मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. मंदिराच्या मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. या मंडपात एकूण १२ खांब असून मधोमध नंदी आहे.प्रत्येक अन प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक काम पाहून डोके चक्रावून जाते. या नंदीवरील कोरीव आभुषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल.
सभामंडपात एका विलक्षण प्रतिमेने लक्ष वेधून घेते....भव्य कासव प्रतिमा... नंदीच्या उजव्या बाजूस ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे तो प्राणी कोणता असावा ते कळत नाही. हे कासव इथे कसे आले? की आधीच इथे होते? ह्या पेक्षाही भावते तो त्याची मन लुभावणारी प्रतिमा....अतिभव्य, सुरेख, सुबक आणि सुरचित.....कासवासारखे नतमस्तक, शरणागत होत, अध्यात्मिक उन्नती हा एकच भावार्थ मनी ठेवत शिवाचे दर्शन घ्यावे असेच तर नाही ना संदेश देत हे कासव?
गर्भगृहाच्या द्वारशाखा
काही खांबावर अशा नर्तकी आहेत.
हे छत तोलुन धरणारे गंधर्व
नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. मंदिराचे गर्भगृह खोल आहे. गर्भगृह चौरस आकाराचे असून अंतरालातून तीन पायऱ्या उतरून आत खाली गेले म्हणजे गर्भगृह लागते. त्यात शिवलिंग आहे.गर्भगृहाच्या भिंतीच्या आतील पृष्ठभागावर नक्षीकाम नाही. अंतराल म्हणजे सभामंडप व गर्भगृह यांत एक अरुंद जोडमार्ग असून द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. त्यात द्वारपाल, कीर्तिमुख, मकर आदी मूर्ती आढळतात.उंबरठ्यावर दोन्ही बाजूंस कीर्तिमुखे आहेत. सभामंडपात कक्षासने (अर्ध भिंती) असून त्यांवर बाहेरच्या बाजूने (मागील बाजूस) शिल्पे आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या
दक्षिणाभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे.
गर्भगृहात शंकराची सुरेख पिंडी आहे.ह्या पिंडीच्या खाली पुन्हा पिंडी आहेत, तसेच या पिंडीला असणा-या छिद्रातुन भुंगे बाहेर येउन त्यांनी मुस्लिम सैन्याला पळबुन लावल्याच्या कथा हे पुजारी सांगतात. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यांत उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिक रीत्या पाणी पाझरत असते. पिंडीसमोर असलेल्या खळग्यात भक्तिभावाने प्रसाद ठेवल्यास प्रसादाचा काही भाग देव ग्रहण करतो अशी भक्तांची श्रद्धा आहे.
प्रतिहारी
व्याल
कीर्तिमुख
अन्य शिवमंदिरांपेक्षा भुलेश्वर येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुख, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगांस कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणाभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगड यामध्ये कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
देवकोष्ट
देवकुलीका किंवा कोनाडा
शंकराचे दर्शन घेऊन आपण जेव्हा सभामंडपात येतो तेव्हा काय बघू आणि काय नको अशी आपली अवस्था होते. सभामंडपाच्या तिन्ही बाजूना कोरीव कामची लयलूट आहे. सभामंडपात एकही असा मोकळा भाग नसेल जिथे कोरीव काम नाही आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. सभामंडपाचे स्तंभ फारसे अलंकृत नाहीत; मात्र त्यांची स्तंभशीर्षे नागशीर्षक किंवा कीचक पद्धतीची आहेत. मंदिराच्या मंडोवरावर तिन्ही बाजूंनी मूर्तिकाम असूनही दक्षिण, उत्तर व पश्चिमेकडील प्रमुख मध्यकोनाड्यांत मूर्ती नाहीत.
या मंदिराचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या सीमा भिंतीला जोडून असलेल्या देवकुलीका ( ओवर्या किंवा कोनाडे ) होत. सीमा भिंती लगत देवकुलिकांची रांग असणे हा स्थापत्यप्रकार पश्चिम भारतात विकसित झाला. ह्याचे मुख्य कारण म्हणजे जैन विधी करता त्याची आवश्यकता होती. अशा जैन मंदिरामध्ये २४ किंवा ७२ देवकुलिका असतात व त्यात भूत आणि भविष्यकाळातील २४ तीर्थंकरांच्या मूर्ती असतात. यवत येतील या मंदिरात इतक्या देवकुलिका कशासाठी बांधण्यात आल्या, याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही. प्रकाराच्या आतील बाजूंस ओवरीयुक्त सोपे (अंकणे) असून त्यांच्या पानपट्टीवर (आर्किट्रेव्ह) शिल्पे आहेत आणि अधूनमधून देवकुलिकाही आढळतात. त्यांतूनही मूर्ती बसविल्या आहेत. मंदिरातील काही मूर्ती फोडलेल्या आढळतात.मुख्य मंदिराच्या गर्भगृहावरील आणि मंडपावरील मुळ शिखर आज शिल्लक नाही. गर्भगृह आणि अंतराळ यांच्या भयांगावर एकूण पाच देवकोष्टे आहेत. या देवकोष्टापैकी तीन देवकोष्ठ गर्भगृहाच्या तीन भद्रावर असून अंतराळाच्या बाह्य अंगावर प्रत्येक बाजूस एक असे दोन देवकोष्टे आहेत. अर्ध खुल्या मंडपावरील वेदीबंधावर नेहमीप्रमाणे अलटून पालटून आकृती, शिल्पे येण्याऐवजी फक्त दोन भूमी समांतर थर आहेत. यातील खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराण कथा मधील दृश्य कोरलेली आहेत
शंकराच्या मंदिरात शेषशायी विष्णुची प्रतिमा बघायला मिळते. अर्थात तिची अवस्था चांगली नाही.
हेमाड्पंती बांधकामाचा पुरावा या खांबांचा जोड पाहा,त्यात कोठेही काही भरलेले नाही.
गरुडधारी संभाव्य भुयारी मंडपातील आतील भींतीवर शेषशायी विष्णूशिल्प आहे.
या जाळ्या अखंड दगडात कोरलेल्या आहेत.
नैसर्गिक प्रकाशाचा उत्तम वापर करुन देवकुलीकातील मुर्ती दिसतील अशी योजना केली आहे
गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर आणि तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत. शंकराचे दर्शन घेऊन आपण जेव्हा सभामंडपात येतो तेव्हा काय बघू आणि काय नको अशी आपली अवस्था होते. सभामंडपाच्या तिन्ही बाजूना कोरीव कामची लयलूट आहे. सभामंडपात एकही असा मोकळा भाग नसेल जिथे कोरीव काम नाही आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. भिंतींवर कोरीवकाम, मूर्तीकाम केलेले आहे.
संपुर्ण मंदिराची, म्हणजे गर्भग्रुहाची बाहेरची भिंत अशा नर्तकींच्या मुर्तींनी नटवलेली आहे.
या सुरसुंदरींच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावेच लागते
मंदिरावरून पाहताना
हातात मृदुंग घेतलेली ही सुंदरी. हीच नाव आहे मर्दला!
प्रेतावर उभी चामुंडा..सप्तमातृका पैकी एका शैवशक्ती चे एक संहारक, रौद्र रूप. पौराणिक कथे नुसार काली अवतारात असताना या शक्ती देवतेने चंड आणि मुंड या दोन शक्तीशाली असुरी वृत्तीच्या राक्षसांना ठार मारले. त्यामुळे हिला चामुंडा हे नाव मिळाले. या देवतेचे वाहन प्रेत असते. पुण्याजवळील भुलेश्वर मंदिरात प्रेतावर उभ्या देवी चामुंडाचे शिल्प आहे. मुर्तिभांजकांनी हात - पाय तोडले असले तरी देवी चामुंडा चे हे अद्भुत शिल्प शिल्पकारांनी इथे कोरले आहे.
महिषासूरमर्दिनी..
मर्कट आणि सुंदरी..
नाग धारण केलेली वनिता..
दर्पणसुंदरी..सौंदर्य आरशात न्याहाळण्या सोबतच शिल्पाचा भावार्थ आहे,
मंदिरात जाण्याआधी स्व-अवलोकन, आत्म-मंथन, आत्म-विश्लेषण करा. आपल्या
भावना, विचार यांचा मागोवा घेत पवित्र मन सौंदर्याने मंदिरात प्रवेश करा.
सप्तमातृकामधील..डावीकडील विनायकी, बैलावर/वृषभावर आरूढ माहेश्वरी आणि मोरावर आरूढ कौमारी....
सप्तमातृकामधील ऐरावतावर आरूढ इंद्राणी..
सप्तमातृका ह्या देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृका ह्या पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे त्या मूर्ती स्त्री रुपात घडवल्या गेल्या. ब्रम्हाची ब्राम्ही/ब्रम्हाणी, इंद्राची इंद्राणी,एन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा ह्या त्या सप्तमातृका! हातात आयुधे आणि हस्तमुद्रा या रुपात त्या आढळतात. नंदीमंडपातील खांबांच्या अग्रभागी यक्ष कोरलेले आहेत. मंदिरात जागोजागी हंस, लतावेल, मकर आणि कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात. मंदिरात ब्रम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे. मातृकांची आयुधे आणि वाहने स्पष्ट कोरलेली आहेत. एकूण शिल्पसंभारातील काही प्रतिमा विलक्षण चित्तवेधक असून लक्षणीय आहेत. त्यांना छायाप्रकाशामुळे उठाव आला आहे. बहुतेक मातृका मूर्ती पर्यंकासनात भद्रपीठावर खोदलेल्या आहेत आणि त्यांची आयुधे व काहींची वाहने स्पष्ट दर्शविलेली आहेत. मातृकानंतर रेलचेल आहे ती नृत्यांगना, वादक आणि सूरसुंदरींची. सुरसुंदरींमधील उत्तरेकडील भिंतीवरील दर्पणधारीचे उत्थित शिल्प मनोवेधक असून ते भग्न झाले असले, तरी अवशिष्ट भागावरून त्याचा सुरेख ढंग दृग्गोचर होतो. डाव्या हातात गोल आरसा घेतलेली ही सुरसुंदरी त्रिभंगात उभी आहे. ती आरशात सौंदर्य पाहून उजव्या हाताने आपले केस व्यवस्थित करीत आहे. तिचे उत्तान पुष्ट स्तन, विशाल नितंब आणि रेखीव हनुवटी, नाक व डोळे तिच्या यौवनात भर घालतात. एकूण मूर्तीला लय असून रेखांकन आकर्षक आहे.
भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे काही शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना. या पैकी डाव्या बाजूला रामायण तर उजवे बाजूस महाभारत शिल्पपट आहेत. पैकी महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण आहेत मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. पैकी त्या उरलेल्या दोन पटांचे काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधण्यास खूपच जिकिरीचे आहे. रामायणातील शिल्पपटात राम-भारत भेट, सीता स्वयंवर, तसेच सीता विवाहप्रसंगी करतात तो गौरीहरपूजन हा सोहळा दाखवला आहे. या शिल्पातील सीतेच्या भावमुद्रा, तिचे आणि सख्यांचे अलंकार, तोरणे नुसती बघतच राहावीत. महाभारतातील शिल्पपटात अर्जुनाचा मत्स्यभेद, कौरव-पांडव युद्ध, भीष्म बाणांच्या शय्येवर दाखवले आहेत, भीम गदेने हत्तींना मारत आहे, इ. अनेक प्रसंग कोरलेले आहेत. सर्वात प्रथम रामायणातील काही शिल्पपटांची माहिती करून घेऊ या ; १. राम लक्ष्मण सीता :- इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले.
रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर. पायर्यांनजीकच्या उजवे बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमा सुद्धा बसवलेल्या आहेत.
दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल यत्किंचितही शंका नाही, मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा.
२. रामायण अखंड शिल्पपट:- दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो.
मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. तसेच हा प्रसंग सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध तदनंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा, अशी शक्यता आहे.
उजवे बाजूच्या खालच्या पटात अग्नी हा दशरथाला पायसदान देत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे. तर त्याच्या शेजारी उजवीकडे एक स्त्री आपल्या सेविकांसह शिवलिंगाची पूजा करताना दाखवली आहे. ही बहुधा कौसल्या असावी जी अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करत आहे किंवा हा संपूर्ण वेगळाच प्रसंग असून ती स्त्री ही सीता असावी जी सुयोग्य पतीसाठी प्रार्थना करत आहे. दुसरी शक्यताच मला अधिक योग्य वाटते.
याच्या वरच्या शिल्पपटात रामाकडून धनुर्भंग होतो आहे आणि सीता ही वरमाला घेऊन स्वयंवरासाठी सज्ज असल्याचे दाखवले आहे. उजवीकडे जनक हा सिंहासनावर बसलेला असून रामाच्या डाव्या बाजूला मृगाजीनात दाढीवाला विश्वामित्र व लक्ष्मण अगदी स्पष्ट दिसतात. त्यांच्याच शेजारी सांडणीस्वार सीतास्वयंवराची दवंडी पिटत असताना दाखवले आहेत.
३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) )
मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात.
यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.
४. रामायण शिल्पपट (डावी बाजू)
यानंतरचे येथील सलग असलेले दोन शिल्पपट मात्र गायब आहेत. पैकी त्यातील एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे. काही मिपाकरांनी आमच्या सोबत ह्या दोन्ही पटांचे दर्शन घेतलेले आहे.
त्यातीलच एक नंदीमंडपाशेजारील भिंतीत असलेला पट म्हणाजे मारीचवध.
पटाच्या उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे. मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.
४. रामायण शिल्पपट :- यातील एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे.
रामायणातील सुप्रसिद्ध मारिचवधाचा प्रसंग सभामंडपात कोरला आहे.. ५. मारिचवध उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे. मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.
श्रीराम वानरसेना घेऊन परतत आहेत (डावीकडून..)
हत्ती घेऊन भेटीला येत आहे अत्यंत प्रिय बंधू भरत...
६. अगम्य शिल्पपट ह्या पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत. एक अंदाज म्हणाल तर ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल.
इथे रामायणातील शिल्पपट पूर्ण होतात. यातील एकच अखंड असून इतर दोघांचे काही अंशच सध्या इतस्ततः पाहता येतात.
आता वळूयात महाभारतातील शिल्पपटांकडे.
महाभारतातील काही शिल्पपट :- महाभारतातील शिल्पपट रामायणातील शिल्पपटाच्या तुलनेत संपूर्ण आणि सलगपणे बर्यापैकी अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व ह्या पर्वांमधील आहेत. रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.
१. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट:- यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे. द्रुपदाच्या डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की येथील शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते.
कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.
८. द्रौपदीस्वयंवर पट (उजवीकडील बाजू)
यानंतर मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
२. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू) या मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
१०. द्रौपदीस्वयंवर (डावी बाजू)
याच्या शेजारचा एक पट मात्र द्रोणपर्वातील आहे जो आपण नंतर पाहू. सुरुवातीला आधी आपण भीष्मपर्वातील पट पाहू ज्यात भीष्मवधाचा प्रसंग कोरलेला आहे. हा पट नंदीमंडपाच्या समोर असलेल्या सभामंडपाच्या उजव्या बाजूने सुरु होतो.
हा शिल्पपट सुरु होतो अर्जुन भीष्म यांच्या युद्धापासून. ह्या शिल्पपटांछ्या रथींच्या प्रतिमा भंग झाल्यात पण त्यांच्या ध्वजांवरुन ते योद्धे अगदी सहजी ओळखू येतात.
ह्या पटात अर्जुन भीष्माशी शरयुद्ध खेळत आहे. सारथी कृष्ण चततुर्भुज विष्णूरूपात असून अर्जुनाच्या ध्वजावर वानर आहे. तर त्याच्या समोर भीष्म तालध्वजासह रथावर आरूढ आहे.
३. अर्जुन -भीष्म युद्ध :- कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री असलेल्या शिखंडीशी मी युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात.
रथावर आरूढ कृष्ण आणि अर्जुन..
ह्या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.
१२. भीष्मवध
यांनंतर ह्याच्या उजवीकडचा जो शिल्पपट आहे तो आहे भीष्म शरशय्येचा.
भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
१३. भीष्म शरशय्या
पितामह भीष्म मृत्यूशय्येवर असताना त्यांना भेट देणारे पांडव....
४. भीष्म शरशय्या:- भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
१४. द्रोणपर्व (संपूर्ण शिल्पपट)
यातील पहिल्या प्रसंगात एक द्रोणाचार्य आहेत हे निश्चित जे त्यांच्या सुवर्णमय कमंडलू च्या ध्वजावरुन समजून येते. त्याच्याशी युद्ध करणारा पांडवयौद्धा बहुधा खङगधारी दृष्टदद्युम्न किंवा मेष ध्वजधारी शिखंडी असावा.
१५. द्रोण व पांचालवीराचे युद्ध
ह्यानंतर कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही. ह्याच्या पुढचे शिल्प मात्र अतिशय रोचक आहे. द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच. एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
१६. अर्जुन- कौरववीर युद्ध
कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही.
१७. भीम-गजयुद्ध
द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच. एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
घटोत्कच युद्ध..
.
गजयुद्धः भीम हत्ती उचलून फेकून देतांना.
ह्याच्या बाजूलाच पट आहे तो शल्यपर्वातला.
द्रूष्टदुन्म्य आणि पांडव कथा
ह्यात एक पांडवयोद्धा दाखवला असून तो मी ओळखू शकलो नाही. त्याच्या ध्वजावर मनुष्याचे शिर आहे. असा ध्वजचिन्ह असलेला कुठलाही योद्धा मला माहितीत नाही. द्रौपदेयांच्या ध्वजांवर चंद्र, सूर्य, यम आणि अश्विनीकुमारांच्या प्रतिमा होत्या असा महाभारतात उल्लेख आहे पण तो ह्या आकृतीशी जुळत नाही. शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय.
१८. शल्ययुद्ध
गजयुद्ध – महाभारतात माणसांना माणसे भिडली होती, योद्धांना योद्धा, महापुरुषांना महापुरुष, अमर आत्मांना अमर आत्मा आणि गजांना दुसरे तुल्यबळ गज
७. शल्ययुद्ध शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय.
हे शिल्पपट पौराणिक आणि रामायण , महाभारत यांची अनमोल माहिती देतात. असे हे दुर्मिळ शिल्पपट रामायण आणि महाभारताचा सखोल अभ्यास असेल तर अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यानंतर काही अंशी तर ओळखता येतात.
इथे भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट संपतात.
सभामंडपात एका ठिकाणी उंचावर समुद्रमंथन प्रसंग शिल्पपट आहे..समुद्रमंथन एक
सुप्रसिद्ध पौराणिक कथा आहे. देव आणि दानवांनी मिळून हे समुद्रमंथन केले
होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्राचे वैभव समुद्रात मिळाले. समुद्रात
पडलेले वैभव परत मिळवण्यासाठी विष्णूने इंद्राला समुद्रमंथनाचा उपाय
सुचवला. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी करून आणि वासुकी सर्पाची दोरी
करून समुद्रमंथन करावे. त्यातून अमृतप्राप्ती होईल . वैभव पुन्हा प्राप्त
होईल. अशी ही थोडक्यात कथा असणारे हे शिल्प!
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या
सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर
नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन
चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच
आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही
शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर
यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. (युध्द आणि
परकीय आक्रमण) इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे
येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे. मूर्तीभंजकांनी ह्या शिल्पांची तोडफोड केली
असली तरी शिल्पकारांनी किती कल्पकतेने शिल्पांमध्ये सौंदर्य भरले आहे
ह्याची कल्पना शिल्प पाहताना येते.
विनायकी गणेश :-
भुलेश्वर मंदिरात आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे ते म्हणजे गणपतीचे. आपण नेहमी गणपतीला पुरुषरुपात पाहतो, पण येथील गणपती स्त्रीरूपात आहे. हा गणपती विनायकी किंवा लंबोदरी, गणेश्वरी किंवा गणेशानी, विनायकी गणेश इ. नावानी ओळखला जातो. स्त्रीरूपातील गणेशाचे पाटेश्वरनंतर भुलेश्वर हे दुसरे ठिकाण आहे. मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरूपी दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलासलेण्यात त्या प्रकारचे शिल्प आढळते. विनायकी गणेशाचे दोन शिल्पपट भुलेश्वर मंदिर आहेत. या दोन्ही शिल्पपटात गणेशानी आणि दोन मातृकांच्या बाजूने भगवान महावीरांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या दोन्ही शिल्पपटातील गणेशानी पद्मासनात आसनस्थ असून चारी हातात आयुधे धारण केलेली आहेत. पायाजवळ मूषक हे वाहनही कोरलेले आहे. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या पंधरा हजार श्लोक असलेल्या काशिखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा उल्लेख आढळतो. देवीसहस्त्रनामात त्या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपती यांच्याप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. तेथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. भुलेश्वराच्या मंदिरात मातृकापट्टांत भैरव आणि गणेश यांच्या मूर्ती आढळत नाहीत, मात्र गणेशीची किंवा वैनायकीची मूर्ती दिसते. ही मूर्ती यादवकालीन शिल्पात इतरत्र क्वचित आढळते. त्याचप्रमाणे उंटाचे शिल्पांकन महाराष्ट्रात अकोला (अहमदनगर जिल्हा) येथील तत्कालीन सिध्देश्वराच्या मंदिरातच फक्त दिसते. त्यामुळे वास्तूशिल्पशैलीच्या आधारे या मंदिराचा काळ तज्ञांनी इ. स. तेराव्या शतकाचा प्रारंभ असा ठरविला आहे.
या वैनायकी शिल्पाची आणखी सविस्तर माहिती घेउया. वैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका - गणपतीचे संपूर्ण भारतात अस्तित्व बघायला मिळत असले तरी गणपतीचे पूजन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. विघ्नांचा नाश करणारा, भक्तांचे रक्षण करणारा, मंगलमय वातावरणाची निर्मिती करणारा देव म्हणून गणपतीकडे बघितले जाते. विघ्नकर्ता असणारा गणपती पूजा केल्यास विघ्नहर्ता होतो. गणपतीच्या मूर्तीकडे बघताना सुटलेले पोट, हत्तीची सोंड, मोदक, भव्य गंडस्थल, आखूड मांड्या या गोष्टींकडे लक्ष वेधले जाते. हिंदू दैवतांमध्ये ह्याचे आगमन उशिरा झाले असले तरी फार कमी कालावधीत हिंदू धर्मातील मुख्य देवता होण्याचा मान गणपतीने मिळवला आहे. प्रत्येक शुभकार्य हे गणपतीच्या पूजेशिवाय अशक्य आहे. शैव, वैष्णव, शाक्त पंथाप्रमाणे गणपतीला पुजणारा गाणपत्य पंथ उदयाला आला. फक्त गणपती करिता “गणेशपुराण” आणि “मुद्गलपुराण” अशा दोन उपपुराणांची निर्मिती झाली. हिंदू धर्माबरोबर गणपतीचे अस्तित्व बौद्ध आणि जैन धर्मातसुद्धा दिसून येते. अनेक आशियाई देशांमध्ये गणेश देवतेचा प्रसार झाला आहे. दक्षिणेकडील राज्यात गणपती ब्रम्हचारी असतो, तर महाराष्ट्रात रिद्धीसिद्धी त्याच्या दोन पत्नी आहेत. हिंदू धर्मात शक्ती संकल्पनेचा उदय झाल्यानंतर प्रत्येक देवतेची शक्ती म्हणून देवतांना स्त्रीरुपात दाखवण्यास सुरुवात झाली. उदा. ब्रह्मा-ब्रह्माणी, विष्णु-वैष्णवी, महेश्वर-माहेश्वरी इ. मध्यकाळात मुख्य देवता म्हणून विनायकाची पूजा सुरु झाली आणि लवकरच विनायकाची शक्ती म्हणून वैनायकीची सर्वत्र पूजा होऊ लागली. एच. डी. भट्टाचार्य यांच्या मते मुख्य देवता म्हणून गणेशाचे पूजन होऊ लागले, त्याचवेळी गणेशाची शक्ती म्हणू गणेशानी हिचे पूजन होण्यास सुरुवात झाली असावी. विनायकी, विघ्नेश्वरी, गणेशानी, गणेस्वरी, गजानना, गणपतीहृदया इ. वैनायकीची काही नावे आहेत. सहाव्या शतकातील वराहमिहिरलिखित “बृहदसंहिता” ग्रंथात मातृकांच्या मूर्तीविषयी खालील श्लोक आहे. मातृगण: कर्तव्य: स्वनामदेवानुरूपकृतचिन्ह:| रेवन्तोश्वारूढो मृगयाक्रीडादिपरिवार॥ (बृहतसंहिता, अध्याय ५७, श्लोक ५६) श्लोकानुसार मातृका ज्या देवाच्या आहेत, त्या देवाचे रूप ध्यानात ठेवून बनवल्या पाहिजेत. यात कुठेही मातृकांच्या नावाचा उल्लेख नाही आहे. श्लोकातील पहिला ओळ मातृकांविषयी, तर दुसरी ओळ सूर्यपुत्र रेवंतविषयी आहे. उत्पल (९वे-१०वे शतक) यांनी बृहदसंहितेवर टीकात्मक ग्रंथ लिहिला. उत्पल यांनी बृहतसंहितेतील मातृकांच्या श्लोकावर टिका करताना मातृकांना ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, यामी, वारुणी, कौबेरी ही नावे दिलेली आहेत. त्याचबरोबर नारसिंही, वाराही आणि वैनायकी या इतर मातृका आहेत असे सांगितले आहे. सोळाव्या शतकात केरळ येथील श्रीकुमार यांनी देवतांच्या मूर्तीविषयी “शिल्परत्न” हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात शक्ती-गणपतीचे वर्णन करणारा पुढील श्लोक आहे. द्वाभ्यां विभ्राजमानं द्रुतकनकमहाशृङ्खलाभ्यां कराभ्यां बीजापूरादिशुम्भद्दशभुजललितं पञ्चबीजस्वरूपम् | सन्ध्यासिन्दूरवर्णं स्तनभरनमितं तुन्दिलं सन्नितम्बं कण्ठादूर्ध्वं करीन्द्रं युवतिमयमधो (तं?) नौमि देवं गणेशम् ॥ (शिल्परत्न – उत्तरार्ध, अध्याय २५, श्लोक ७४) सारांश: त्याचा कंठाखालचा भाग युवतीसारखा आणि कंठावरचा भाग हत्तीसारखा आहे. शेंदुरासारखा लाल वर्ण आणि स्तनामुळे झुकलेला तुंदिलतनू असा तो शक्तीगणपती आहे.
पुराणातील वैनायकीचे संदर्भ :- स्कंदपुराणाच्या काशीखंडात (४५वे प्रकरण) व्यासऋषी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्कंदऋषी चौसष्ट योगिनींची नावे सांगतात आणि त्यातील पहिले नाव गजानना आहे. मत्स्यपुराणामध्ये २०० स्त्रीदेवतांचा उल्लेख आहे आणि वैनायकी त्यापैकी एक नाव आहे. परंतु अग्नीपुराणात उल्लेखलेल्या योगिनींच्या नावामध्ये गजानना किंवा वैनायकी नावाचा उल्लेख नाही आहे. देवी-सहस्त्रनाम ग्रंथात देवीच्या एक हजार नावांचा उल्लेख केला आहे. त्यात विनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी ह्या तीन नावांचा उल्लेख आला आहे. विष्णुधर्मोत्तरपुराण आणि मत्स्यपुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करताना, त्याचे रक्त जमिनीवर पडल्यानंतर नवीन अंधकासुराची निर्मिती होऊ नये म्हणून युद्धात त्याच्या पडलेल्या प्रत्येक रक्ताचा थेंब भक्षण करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यापैकी एक मातृका म्हणजे वैनायकी. लिंगपुराणात विनायकीचा उल्लेख आलेला आहे.
जैन आणि बौद्ध धर्मातील वैनायकीचे स्वरूप :- जैन धर्मात वैनायकीची योगिनी म्हणून उपासना केली जात होती. बडोदा येथील जैन मंदिररातील हंस विजय संग्रहात “चतुष्षष्टियोगिनी” (हस्तलिखित क्र. ३९६) हस्तलिखितात महायोगी, सिध्दीयोगी, प्रेताक्षी, डाकिनी आणि इतर योगिनींच्या नावाबरोबर गणेश्वरी हे नाव आलेले आहे. बौध्दधर्माच्या वज्रयान पंथात वैनायकीला गणपतीहृदया नावाने ओळखले जाते. अमृतानंदलिखित “धर्मकोशसंग्रह” ग्रंथात गणपतीहृदया या देवीचे वर्णन नृत्यस्थिती, एकमुख, द्विभुज, एक हात वरदमुद्रेत आणि दुसरा हात अभयमुद्रेत असे करण्यात आले आहे. जैन आणि बौद्ध धर्मानी वैनायकीला आपल्या देवतांमध्ये समाविष्ट केले याच्यावरून तिचे महत्त्व दिसून येते.
सप्तमातृका आणि गणेश :- वैनायकी आणि इतर मातृकांची निर्मिती शंकराने केली, म्हणून मातृकांना गणेशाची माता असे मानले जाते आणि म्हणूनच सप्तमातृकापटांमध्ये गणपती दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक हिंदू लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये सप्तमातृकापट दिसून येतात. परंतु, पाटेश्वर लेण्यातील मातृकापटात गणपतीला स्थान देण्यात आलेले नाही. “सुप्रभेद आगम” ग्रंथात सप्तमातृकांबरोबर गणेश दाखवावा असे लिहून ठेवले आहे. सुप्रभेदागमनुसार सप्तमातृका/अष्टमातृका शिल्पपटात पूर्वेला वीरभद्र आणि पश्चिमेला गणपतीची मूर्ती असते. मातृकापटात उजव्या बाजूला पहिला गणपती आणि वीरभद्र (भैरव) डाव्या बाजूला सर्वात शेवटी असला पाहिजे असे भुवनदेव लिखित अपराजित पृच्छा या ग्रंथात नमूद केले आहे. चतुर्भुजास्तु सर्वाश्च नलिनास्ताश्च संस्थिता: | वीरभद्रन्तु पूर्वे तु विघ्नेशं पश्चिमं दिशि ॥ (सुप्रभेद आगम – मातृस्थानविधिपटल, ४२-६) मातृणां च ततो वक्ष्ये भैरवादिगणांस्तथा | वीरेशं कारयेव्दत्स वीणाहस्तं सनर्त्तनम् ॥ गणनाथं तत: कुर्यात् गजवक्त्रं महोत्कटम् आदौ तु गणनाथं च ह्यन्ते कुर्यात्तु भैरवम् ॥ (अपराजित पृच्छा – २२३, १२-१३) सप्तमातृका, वेरूळ लेणी वैनायकीची लघुचित्रे काही मोजक्या लघुचित्रांमधून (Miniature Paintings) पण आपल्याला वैनायकीचे दर्शन होते. नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्र आहे. ह्या चित्रात नटेश (शंकर) तांडव नृत्य करत असून त्याच्या शेजारी विनायक, कार्तिकेय आणि गण दाखवले आहेत. ह्या चित्रात विनायक वीणा वाजवत असून नटेशाच्या डाव्या बाजूला गजमुख, चोळीधारण केलेली, मृदुंग वाजवणारी आणि कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेली वैनायकी चित्रित केलेली आहे. एशियाटीक सोसायटी, कोलकाता येथे “गणपतीहृदया” देवतेचे अत्यंत सुंदर लघुचित्र आहे. हे लघुचित्र वज्रयान पंथाच्या धारणी-संग्रह ह्या ग्रंथात आहे. चित्रातील देवता पांढऱ्या रंगात रंगवलेली असून पायाजवळ निळ्या रंगात उंदीर आहे. ह्या चित्राजवळ नेवारी संवत ९६३ (सन १८४३) आणि सर्वात शेवटी “आर्य्यश्रीगणपतिहृदयनामधारणी समाप्त” लिहिले आहे. वैनायकीची मूर्तीवैशिष्ट्ये :- गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओडिसा, आसाम आणि तामिळनाडू येथे वैनायकीची काही शिल्प उत्खननात, तर काही शिल्प मंदिरात बघावयास मिळतात. उपलब्ध शिल्पांनुसार वैनायकी आसनस्थ, वाहनावर आरूढ, उभी किंवा क्वचित नृत्यावस्थेत असते. वैनायकी शिल्प दोन किंवा चार हातांची आहेत. तसेच हातामध्ये परशु, पास, कमळ, दंड, सर्प, दात, मोदकपात्र, जपमाळ इ. विविध आयुधे किंवा वस्तू धारण केलेल्या आहेत. तसेच त्या अभयमुद्रा (संरक्षण) आणि वरदमुद्रेत (आशीर्वाद) असतात. इतर राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वैनायकी शिल्प मथुरा येथील शासकीय संग्रहालयात असलेली वैनायकीची मूर्ती भारतातील सगळ्यात जुनी मूर्ती असावी. ह्या मूर्तीचा काळ गुप्त राजवंशाच्या सुरुवातीचा आहे असे मानले जाते. ही मूर्ती द्विभुज असून डाव्या हातात कमळाचे फुल धरले आहे. लोहरी (उत्तरप्रदेश) येथील योगिनी संकुलातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. प्रतिहार काळातील (९वे शतक) ही मूर्ती असून ह्या मूर्तीच्या डाव्या हातात इंद्रासारखे वज्र आहे. तर उजव्या हातात लाडूऐवजी एखादे फळ धरले आहे. ह्या वैनायकीचे वाहनसुध्दा हत्ती आहे. त्यामुळे हि मूर्ती वैनायकीची असली तरी त्यात इंद्राणी (इंद्राची शक्ती) हिचे गुणधर्म दाखवले आहेत. रीखीआन (उत्तरप्रदेश) येथील वैनायकीला चार हात असून डोक्यावर मुकुट आहे आणि गळ्यात हार घातलेला आहे. ह्या मूर्तीला नेसवलेली साडी कंबरेभोवती खोचण्यात आलेली आहे. मध्यप्रदेशातील सुहानिआ येथे सापडलेली मूर्ती ग्वाल्हेर येथील पुरातत्व संग्रहालयात ठेवलेली आहे. वैनायकी त्रिभंग मुद्रेमध्ये असून आपले संपूर्ण वजन डाव्या पायावर घेतले आहे. ह्या मूर्तीच्या हातात कमळपुष्प, तलवार, परशू आणि लाडूंचा वाडगा हातात धरला आहे. ह्या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ बासरीवादक आणि डाव्या पायाजवळ मृदुंगवादक आहे. सतना (मध्य प्रदेश) येथे उत्खननात सापडलेली आणि सध्या कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात असलेली दहाव्या शतकातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. सिंहारूढ वृषभा मातृकेच्या मांडीवर बालगणेश बसलेला आहे. सिंहाच्या पायाजवळ आसनस्थ चतुर्भुज वैनायकी आहे. हिच्या हातात कमळाचे फुल आणि दुसऱ्या हातात पुष्प आहे. उजव्या हातात गदेसारखे शस्त्र आणि डावा हात नष्ट झाला आहे. बहुदा या हात मोदकपात्र असावे. वृषभा मातृकेच्या खालील भागात श्री वसभा (श्री वृषभा) असे कोरलेले आहे.. चिदंबरम, तामिळनाडू येथे नटराजाचे मंदिर आहे. या मंदिरात असलेली वैनायकीची मूर्ती सोळाव्या शतकात विजयनगर राज्यकाळात तयार केली आहे. या मूर्तीचा कमरेच्या वरील भाग वैनायकीचा असून कमरेखालील भाग व्याल या काल्पनिक प्राण्याचा आहे. या वैनायकीची आजही तेथील स्थानिकांकडून पूजा केली जाते. व्याल आणि वैनायकी यांचे संयुक्त असे हे एकमेव शिल्पांकन आहे. याशिवाय चौसष्ट योगिनी मंदिरांमध्ये वैनायकीचे शिल्प बघायला मिळते. महाराष्ट्रातील वैनायकी शिल्प :- महाराष्ट्रात वैनायकीची शिल्प यादवकालीन भुलेश्वर मंदिर (पुणे), पाटेश्वर मंदिर (सातारा) आणि योगेश्वरी मंदिर (आंबेजोगाई) येथे बघायला मिळतात. वैनायकी, पाटेश्वर मंदिर
पाटेश्वर मंदिरात असलेली वैनायकी :- साताऱ्यापासून साधारणपणे ११ किमीवर देगाव येथे पाटेश्वर हा हिंदू लेणीसमूह आहे. येथील पाटेश्वर मंदिरात वैनायकी मूर्ती आहे. मूर्ती रेखीव, चतुर्भुज आणि शिलाखंडावर सुखासनात बसलेली आहे. मूर्तीच्या हातात परशु, पाश(?), सुळा आणि लाडूपात्र आहे. सोंडेचे टोक वळसा घालून लाडूंना टेकलेले आहे. मूर्तीच्या अंगावर वक्षभूषण, कंठभूषण, कमरपट्टा, कंकणे आणि वळे हे अलंकार असून त्यांच्यावर विशेष अशी कलाकुसूर नाही आहे. मस्तकावर असलेल्या किरीटमुकुटाभोवती प्रभावळ आहे. डाव्या पायाची आडवी मांडी घातलेली असून आहे आणि उजवा पायाचा गुडघा किंचित वर उचललेला असून पाय खाली टेकलेला आहे. पायाजवळ मूषक वाहन कोरलेले आहे. भुलेश्वर मंदिरातील वैनायकी :- पुणे – सोलापूर महामार्गावर यवतच्या आधी साधारणपणे १-२ किमीवर भुलेश्वरफाटा आहे. हा रस्ता थेट भुलेश्वर मंदिराजवळ जातो. दूरसंचार विभागाचा मनोरा हि भुलेश्वरची ओळख. हा संपूर्ण परिसर दौलतमंगळ किल्ला किंवा भुलेश्वर मंदिर या नावाने ओळखला जातो. मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर थोड्या उंचीवर दोन वैनायकी मूर्ती आहेत. परंतु येथील वैनायकी इतर मातृकांबरोबर आहेत. हे दोन्ही मातृकापट आहेत. पहिल्या मातृकापटात वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही या तीन मातृका आहेत. या शिल्पपटात वैनायकी माहेश्वरीच्या उजव्या हाताला तर ब्राम्ही डाव्या हाताला आहे. दुसऱ्या शिल्पपटात वैनायकी, वैष्णवी आणि कौमारी या मातृकांबरोबर आहे. दोन्ही वैनायकी सालंकृत (पायात वळे, हातात कंकणे, गळ्यात वक्षभूषण व कंठभूषण दागिने) आणि पद्मासनात बसलेल्या आहेत. एका वैनायकीने हातात अंकुश, पाश(?), दात आणि लाडूपात्र धारण केले. दुसऱ्या वैनायकी शिल्पाचा डावा हात नष्ट झालेला आहे. पण ह्या हातात लाडूपात्र असावे आणि इतर आयुधे आधीच्या वैनायकीप्रमाणे धारण केली आहेत.
योगेश्वरी मंदिराच्या शिखरावरील वैनायकी आंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिराच्या शिखरावरील कोनाड्यात वैनायकीची मूर्ती आहे. वैनायकीला सोळा हात असून मोदक, जपमाळ, तलवार, गदा आणि इतर आयुधे धारण केली आहेत. वैनायकीचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. सोंडेचे टोक डाव्या हातातील लाडूला स्पर्श करते आहे. मोरपिशी रंगाची साडी नेसलेली वैनायकी पद्मासनात बसलेली आहे. प्रत्येक हातात कंकण आणि डोक्यावर मुकुट याशिवाय इतर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत. वैनायकीबद्दल मूर्तिशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये (अपवाद श्रीकुमाररचित शिल्परत्न) जास्त माहिती मिळत नसल्यामुळे तिच्याभोवती एक वेगळेच गूढवलय निर्माण झाले आहे. वैनायकीचे कोडे सोडवायचे असेल तर अजून संशोधन होणे गरजेचे आहे आणि ह्या संशोधनातूनच वैनायकीची नवीन माहिती उजेडात येईल. मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्स्रनामात या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. भुलेश्वर मंदिर हे पुरातत्वखात्याने ताब्यात घेतले असून राष्ट्रीय संरक्षक म्हणून जाहीर केले आहे. पुण्यापासून पन्नास किमी अंतर आहे. सासवड व यवतहूनही मंदिराकडे येण्यासाठी रस्ते आहेत. गडाच्या पायथ्याला भुलेश्वर वन उद्यान गावाच्या गायरान जमिनीत उभे आहे. पायथ्याला मोठी वसाहत होती. त्याच्या खाणाखुणा आजही लक्षवेधून घेतात. ढासळलेली मसजिजदही लक्ष वेधून घेते. हिरव्यागर वनराईने नटलेला परिसर व शिल्पसौदर्यांचा अनोखा नजराना खिळवून ठेवतो.
मुख्य मंदिराच्या बाह्यभागात दगडी घंटेची आरास आहे. हि सर्व शिल्प बघत असताना एक गोष्ट नजरेत पडते ती म्हणजे या शिल्पठेव्यातील एकही मूर्ती अखंड नाही आहे. निष्टुर मूर्तीभंजकानी इथली मूर्तींवर घणांचे घाव घालून कोणाचे हात, कोणाचे कान, कोणाचे मस्तक आणि कोणाचे दोन्ही पाय तोडलेले आहेत. मूर्ती अखंड नसल्या तरी मूर्तींचे शिल्पसौंदर्य कमी होत नाही. एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते? समाधान, विरंगुळा, ऊर्जा, मनाला छेडणारी तार.. हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या सौंदर्यतेच्या मापदंडाचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसुकच या सौंदर्यतुषारात भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात ‘भुलवून’ सोडणारं हे भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. पुरातत्त्व खात्याने ते मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.कसे जाल १) पुणे -सोलापुर महामार्गाने :- पुण्यापासून अंदाजे ५८ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. लोणी काळभोर- उरळी कांचन - यवत असा हा रस्ता आहे. पुण्यातील बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत सासवड ही बस ही यवतवरुन भुलेश्वर मार्गे सासवडला जाते .
स्वत:च्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गा वरून ( पुणे – हडपसर- उरळी कांचन ) साधारणपणे ४५ किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवतच्या अलीकडे दोन कि.मी अंतरावर भुलेश्वर फाटा आहे.यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलिस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजुच्या घाटाच्या रस्ता आहे. भुलेश्वर डोंगराकडे जाणारा हा रस्ता दोरगेवाडीनंतर एकदम मोकळा आहे. मधूनच एखादे वाहन गेले तर, नाहीतर ह्या रस्त्याने जाणारी वाहने फार कमी. पावसाळा सोडला तर हा परिसर तसा रुक्ष. दोरगेवाडीतूनच डोंगरमाथ्यावरील भुलेश्वर मंदिर आणि त्याशेजारी असलेला दूरसंचार विभागाचा मनोरा आपल्याला खुणावत असतात. महामार्गापासून सुमारे १० कि.मीचे अंतर पार केल्यानंतर आपण भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी येतो आणि इथून पुढे सुरु होतो वळणावळणाचा कठीण घाट. घाट पार केल्यानंतर आपण माथ्यावर असलेल्या पठारावर येऊन पोहोचल्यानंतर आपले लक्ष वेधून मंदिराचे कळस आणि दौलत मंगळ किल्ल्याचे मागे उरले अवशेष. पुण्यावरुन सोलापुर महामार्गाने येताना टोल द्यावा लागतो.यवत गावापासून भुलेश्वर मंदिर १० किलोमीटर अंतरावर आहे.
२) सासबड मार्गे :- पुणे- हडपसर- दिवे घाट मार्गे सासवडला आल्यावर डावीकडे वळण घेउन माळशिरस रस्ताला वणपुरी- वाघापुर-राजेवाडी- माळशिरस तिथून डावे वळण घेउन भुलेश्वर मंदीरात पोहचता येते. यामार्गे अंतर ६० कि.मी. भरते. राहाण्याची सोय: गडाचा,मंदिराचा परिसर मोठा असून राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय: गडावर जेवण्याची सोय नाही. दर रविवारी भुलेश्वर मंदिरात प्रसाद असतो. पाण्याची सोय: पाण्याची सोय आहे. प्रवेश फि- प्रति वाहन १० ते ५० रु प्रवेश फि घेतली जाते. पार्किंग :-पार्किंगसाठी भरपुर जागा असून बाईक, कार पार्क करता येतात. मोठ्या बस थोड्या काळजीपुर्वक पार्क करता येतील.
संदर्भ :- १) पुणे जिल्हा गॅझेटीयर २) मराठी रियासत..गो.स.सरदेसाई,खंड एक. ३) राजा शिवछत्रपती ...पूर्वार्ध..लेखक बाबासाहेब पुरंदरे ४) मराठ्यांचा इतिहास..खंड पहिला.संपादक ग.ह.खरे आणि अ.रा. कुलकर्णी ५) www.trekshitiz.com हि वेबसाईट ६) www.durgbharari.in हि वेबसाईट ७) प्र.के.घाणेकर, आशुतोष बापट , सागर बोरकर यांचे लिखाण ८) स्थापत्य- महाराष्ट्र शासन ९) https://drifteradwait.com १०) http://harshad-gaaanikha.blogspot.com ११) http://sagarshivade07.blogspot.com १२) https://faktitihas.wordpress.com १३) https://titbitz.wordpress.com १४) http://ekpravas.blogspot.com १५) https://mr.vikaspedia.in १६) Deglurkar, G. B. Temple Architecture and Sculpture of Maharashtra, Nagpur, 1974. १७) पारसनीस, द. ब. श्रीमहापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार, मुंबई, १९००. १८) Naik, A. V. The Bhuleshvar Temple Near Yavat; Bulletin of the Deccan College Research Institute, Vol. IV No.2, December, 1942, Poona. १९) http://www.shivbharat.com २०) https://www.esakal.com/saptarang/bhuleshwar-temple-pune-intricate-carvingsramayana-and-mahabharata-blending-historical-significance-stunning-architecture-asb02
शिवालयातलं रामायण - महाभारत
सकाळ वृत्तसेवा
6–8 minutes
Updated on:
9 लेख बाकी
केतन पुरी
ketan.author@gmail.com
पुणे
शहरापासून अवघ्या ५५ किलोमीटर अंतरावर असणारे भुलेश्वर मंदिर कित्येक
वर्षांपासून असंख्य पर्यटक, अभ्यासक, संशोधक आणि भाविकांचं लक्ष वेधून घेत
आहे. महाराष्ट्रात पूर्व मध्ययुगीन कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या अतिशय
सुंदर मंदिरांपैकी एक म्हणून भुलेश्वरमधील शिवालय प्रसिद्ध आहे.
लिखित पुराव्यांच्या आधारे निश्चित कालखंड सांगता येत नसला, तरीही
शिल्पकला आणि स्थापत्यकीय पुराव्यांच्या आधारे हे शिवालय साधारणपणानं
बाराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधण्यात आलं असावं, असा निष्कर्ष
अभ्यासकांनी काढला आहे. पुढं अनेक वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात
आलेला आहे.
मराठा कालखंडामध्ये ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर यांनी
मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केलेल्या प्रयत्नांचे उल्लेख तत्कालीन
कागदपत्रांमधून वाचावयास मिळतात. बाजीराव पेशवे, चिमाजी आप्पा, अहिल्यादेवी
होळकर या ऐतिहासिक व्यक्तींचाही भुलेश्वर येथील शिवालयाशी
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असल्याचं या कागदपत्रांच्या
माध्यमातून आपल्या लक्षात येतं. आज असलेला मंदिराच्या बाहेरील भाग,
मंदिराचं शिखर आणि मंदिराच्या आतील काही भाग अठराव्या शतकाच्या सुरुवातीस
निर्माण करण्यात आला आहे.
भुलेश्वर मंदिर अनेक कारणांनी प्रसिद्ध
झालं आहे. मंदिराच्या आतमध्ये असणारी विनायकी प्रतिमा (स्त्री अवतारातील
गणेश), चामुंडा, रामायण तसेच महाभारतातील प्रसंग, सुरसुंदरी या
प्रतिमांच्या विपुल उपलब्धतेमुळं भुलेश्वर लोकांना आकर्षित करत आलंय.
प्रेतावर उभी असलेली चामुंडा भग्न अवस्थेत असली, तरीही तिचं उग्र मुख,
बटबटीत डोळे, ओठांबाहेर आलेले सुळे यावरून तिची ओळख सहज पटते.
अस्थिपंजर
शरीराच्या या चामुंडेच्या पोटावर एका विंचवाचे अंकन केलेले आहे. त्यावरून
ही चामुंडा ‘वृश्चिकोदरी’ म्हणूनही ओळखली जाते. मंदिराच्या मंडपाच्या
उजव्या आणि डाव्या बाजूस अनुक्रमे रामायण आणि महाभारताचे अंकन केलेले आहे.
त्यामध्ये अनेक प्रसंग कोरलेले आहेत.
राजा दशरथ आणि त्याच्या
राण्यांनी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून केलेला यज्ञ, सीता स्वयंवरात रामानं
धनुष्याला प्रत्यंचा लावतानाचा प्रसंग, राम-लक्ष्मण आणि हनुमानाची भेट अशा
कितीतरी प्रसंगांचे अंकन या शिल्पपटामध्ये करण्यात आले आहे.
जी
गोष्ट रामायणाची, तीच महाभारताची. पण, महाभारतातील प्रसंगांची संख्या
रामायणापेक्षा जास्त आहे. द्रौपदी स्वयंवराचा प्रसंग, त्यानंतर आपल्या
पत्नीला घेऊन अर्जुन आणि त्याचे भाऊ घरी परतले आणि कुंतीने ‘आणलेली भिक्षा
वाटून घ्या’ असे अनवधानाने म्हणाली तो प्रसंग आणि त्यानंतर लग्न ही
महाभारतातील गोष्ट सांगणारा शिल्पपट आपल्याला दिसून येतो.
त्यामध्ये,
दुर्योधन आणि भीम गदायुद्ध करतानाचा प्रसंग आणि अर्जुनाने आपल्या हातातील
धनुष्यबाणांच्या साहाय्याने केलेला लक्ष्यभेद हे दोन प्रसंग मोठ्या आकारात
चित्रित केले आहेत. तर, स्वयंवरासाठी आयोजित केलेल्या दरबारात बसलेली
मंडळी, पांडव आणि कुंतीची स्वयंवरानंतर झालेली भेट, अर्जुनाला वरमाला
घालणारी द्रौपदी, विवाहसोहळा हे प्रसंग दोन ओळींमध्ये शिल्पित केले आहेत.
दरबारात बसलेल्या मंडळीमध्ये चार हातांचा कृष्ण आणि बलराम आपण सहज ओळखू
शकतो. डॉ. कुमुद कानिटकर यांनी लिहिलेल्या भुलेश्वर शिवालयावरील
संशोधनात्मक ग्रंथामध्ये सविस्तरपणे संपूर्ण शिल्पपट उलगडून दाखवला आहे.
याच
शिल्पपटाच्या बाजूला महाभारताच्या युद्धातील महत्त्वाचे प्रसंग दाखवले
आहेत. त्यामध्ये पितामह भीष्म यांचा देहत्याग, महावीर कर्ण, गुरु द्रोण आणि
शल्य यांचा युद्धामध्ये झालेला मृत्यू शिल्पित करण्यात आलेला आहे. हे
प्रसंग आणि यात दाखवण्यात आलेले योद्धे कोण आहेत हे ओळखण्यासाठी फार उत्तम
सोय शिल्पकारांनी करून ठेवली आहे.
म्हणजे, एका रथावर आपल्याला
महाकपि (हनुमान) ध्वज आणि चार हातांनी युक्त असलेला सारथी म्हणजे कृष्ण
यावरून सदर रथ हा अर्जुनाचा आहे, याचा आपल्याला सहज अंदाज येतो. अशाप्रकारे
रथावर आरूढ झालेले अर्जुन, पितामह भीष्म, कर्ण, द्रोण, शल्य, युधिष्ठिर
यांसारख्या योद्ध्यांचे रथारूढ शिल्प युद्धप्रसंगामध्ये शिल्पित करण्यात
आले आहेत.
महाभारताच्या उपलब्ध सर्व प्रतिंचे एकत्रितपणे संकलन करून
प्रकाशित करण्याचे काम पुणे येथील ‘भांडारकर प्राच्यविद्या संस्था’ने केले
आहे. त्यामध्ये आलेल्या श्लोकांमधील उल्लेखानुसार डॉ. कानिटकर यांनी
योद्धा, त्याच्या रथावर असणारा झेंडा आणि त्या झेंड्याचा उल्लेख असणारा
महाभारतातील श्लोक याचा एक तक्ता त्यांच्या पुस्तकामध्ये प्रकाशित केला
आहे.
पितामह भीष्म आणि शिखंडी यांच्याशी युद्ध करणाऱ्या
अर्जुनाच्या प्रसंगामध्ये पितामह भीष्म यांचा मकर ध्वज सहजपणे ओळखू येतो.
पुढे, देहत्याग करण्याची प्रतीक्षा करत शरशय्येवर पडलेले पितामह भीष्म
आपल्याला दिसतात. त्यांच्यासमोर कौरव, पांडव आणि कृष्ण पितामहांना अभिवादन
करण्यासाठी आले आहेत असे चित्रण केले आहे. त्यानंतर धृष्टद्द्युम्नकडून
द्रोणाचार्यांचा झालेला अंत शिल्पित केला आहे. गुरु द्रोण यांचे ध्वज-निशाण
हे कमंडलू होते. त्यावरून सहजपणे आपल्याला हे शिल्प उलगडता येते.
यामध्ये
द्रोणाचार्यांचा अंत हा शिरच्छेदाने झाला म्हणून या शिल्पामध्ये
द्रोणांच्या रथासमोर शिर पडलेले दिसत आहे. धृष्टद्द्युम्न आपल्या हातात ढाल
आणि तलवार धरून आक्रमणाच्या पवित्र्यात असलेला दिसत आहे. पुढे, कर्ण आणि
अर्जुन या तुल्यबळ योद्ध्याच्या लढाईचा प्रसंग आहे. अर्जुन अर्थात कपिध्वज
असल्यामुळे लक्षात येते. कर्णाच्या शिल्पामध्ये त्याचा ध्वज खंडित झाला
आहे, त्यामुळे तो नेमका काय असावा हे लक्षात येत नाही.
पण महाभारतात
वर्णन केलेल्या प्रसंगानुसार आधी पितामह भीष्म यांचे शरशय्या प्रकरण,
त्यानंतर द्रोणाचार्य यांचा अंत, त्यानंतर कर्ण-अर्जुन यांचे युद्ध,
घटोत्कच वध अशाप्रकारे शिल्पांचे अंकन या शिवालयात केले आहे. द्रोणांचा
मृत्यू आणि घटोत्कच वध यामध्ये कर्ण आणि अर्जुन युद्धाचा प्रसंग कोरलेला
आहे. त्यानंतर मृदुंग अंकित ध्वज धारण केलेला युधिष्ठिर आणि नांगरधारी शल्य
यांच्यातील युद्ध प्रसंग कोरलेला आहे. शल्याच्या झेंड्यावर सीता प्रतिमा
होती, असे महाभारताच्या श्लोकात वर्णन आहे.
पण इथे सीता नांगराच्या
प्रतीकात्मक रूपात दाखविण्यात आली आहे. महाभारत युद्धाच्या अखेरच्या
टप्प्यात युधिष्ठिराच्या मार्फत झालेला शल्यवध इथे चित्रित करण्यात आला
आहे. म्हणजेच, महाभारताच्या आदिपर्वापासून शल्यवधापर्यंत महत्त्वाचे प्रसंग
उत्तम पद्धतीने दाखवले आहेत.
याशिवाय
अनेक मातृका, नाथ संप्रदायाशी निगडित काही शिल्प, समुद्रमंथन, भैरव,
महिषासुर मर्दिनी अशी अनेक शिल्प या मंदिरात अंकित करण्यात आली आहेत.
भुलेश्वर शिवालय अतिशय सुंदर आहे, बाराव्या शतकापासून ते अगदी अठराव्या
शतकापर्यंत मंदिरात टप्प्याटप्प्याने करण्यात आलेले बदल, मंदिरावर विविध
प्रसंगांचे केलेले अंकन, मंदिराचे स्थापत्य आणि पूर्व मध्ययुगीन ते उत्तर
मध्ययुगीन कालखंडापर्यंत मंदिराने टिकवून ठेवलेले स्वतःचे महत्त्व हे सगळं
काही त्या ठिकाणी जाऊन अनुभवणं, अभ्यासणं, मंदिर समजून घेणं हे सगळं काही
अद्भुत आहे.
भुलेश्वर
मंदिरात रामायण आणि महाभारताचे प्रत्येकी तीन शिल्पपट आहेत. ह्या
शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि
त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना. पैकी डाव्या बाजूला रामायण तर
उजवे बाजूस महाभारत शिल्पपट आहेत. पैकी महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण
आहेत मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात
असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. पैकी त्या उरलेल्या दोन पटांचे
काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी
जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधण्यास खूपच जिकिरीचे आहे.
चला तर एकेक शिल्पपट पाहूयात. रामायणपटापासून सुरुवात करुयात.
इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु
ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या
शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले.
रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर.
पायर्यांनजीकच्या उजवे बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या
प्रतिमा सुद्धा बसवलेल्या आहेत.
दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा
प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल मला
यत्किंचितही शंका नाही मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे.
बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा.
१. राम, लक्ष्मण आणि सीता
यानंतर आपल्याला दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो.
नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला
हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला
आहे. मध्यभागी राम लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना
प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा
महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो तो आपण
पुढे पाहूच.
२. रामायण अखंड शिल्पपट
आता यातील एक एक प्रसंग आपण विस्ताराने पाहूयात.
मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. माझ्या
मते हा प्रसंग सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही
दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध
तदनंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा. नक्की कुठला ते
मात्र सांगता येत नाही.
उजवे बाजूच्या खालच्या पटात अग्नी हा दशरथाला पायसदान देत असल्याचा
प्रसंग कोरलेला आहे. तर त्याच्या शेजारी उजवीकडे एक स्त्री आपल्या
सेविकांसह शिवलिंगाची पूजा करताना दाखवली आहे. ही बहुधा कौसल्या असावी जी
अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करत आहे किंवा हा संपूर्ण वेगळाच प्रसंग असून
ती स्त्री ही सीता असावी जी सुयोग्य पतीसाठी प्रार्थना करत आहे. दुसरी
शक्यताच मला अधिक योग्य वाटते.
याच्या वरच्या शिल्पपटात रामाकडून धनुर्भंग होतो आहे आणि सीता ही वरमाला
घेऊन स्वयंवरासाठी सज्ज असल्याचे दाखवले आहे. उजवीकडे जनक हा सिंहासनावर
बसलेला असून रामाच्या डाव्या बाजूला मृगाजीनात दाढीवाला विश्वामित्र व
लक्ष्मण अगदी स्पष्ट दिसतात. त्यांच्याच शेजारी सांडणीस्वार
सीतास्वयंवराची दवंडी पिटत असताना दाखवले आहेत.
३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) )
मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात.
यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग
रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे
दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते
हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.
४. रामायण शिल्पपट (डावी बाजू)
यानंतरचे येथील सलग असलेले दोन शिल्पपट मात्र गायब आहेत. पैकी त्यातील
एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला
आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या
खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर
अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे
दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे
जिकीरीचेच आहे. काही मिपाकरांनी आमच्या सोबत ह्या दोन्ही पटांचे दर्शन
घेतलेले आहे.
त्यातीलच एक नंदीमंडपाशेजारील भिंतीत असलेला पट म्हणाजे मारीचवध.
पटाच्या उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत
आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली
पडलेले आहे. मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो
फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी
पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर
सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या
अगदी बेतात आहे.
५. मारिचवध
ह्याच्या समोरील पट मात्र मी भुलेश्वरच्या असंख्य वार्या करूनही अजूनही
संपूर्णपणे बघू शकलो नाही किंवा ओळखू शकलो नाही. ह्या पटात वृक्ष्, त्यावर
वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत.
माझ्या अंदाजाप्रमाणे मात्र ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा
रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल.
६. हाच तो अगम्य शिल्पपट
इथे रामायणातील शिल्पपट पूर्ण होतात. यातील एकच अखंड असून इतर दोघांचे काही अंशच सध्या इतस्ततः पाहता येतात.
आता वळूयात महाभारतातील शिल्पपटांकडे.
महाभारतातील शिल्पपट मात्र संपूर्ण आणि सलगपणे आजही बर्यापैकी चांगल्या
अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील
आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व
ह्या पर्वांमधील आहेत.
रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.
आधी आपण द्रौपदी स्वयंवर शिल्पपट पाहूयात.
ह्यातही रामायणातील अखंड पटाप्रमाणेच पाच प्रसंग कोरलेले असून मध्यभागी
अर्जुनहस्ते मत्स्यभंग असून दोन्ही बाजूला खालीवर असे दोन दोन पट कोरलेले
आहेत.
७. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट
यातील आता उजवीकडचे दोन पट आता आपण पाहूयात.
यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे.
द्रुपदाच्या डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना
दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की
येथील शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात
दाखवते.
कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची
वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील
लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन
द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण
करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे
ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला
घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.
८. द्रौपदीस्वयंवर पट (उजवीकडील बाजू)
यानंतर मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार
फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज
आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
९. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू)
डाव्या बाजूच्या शिल्पपटामध्ये द्रौपदीस्वयंवरानंतर अर्जुन हा द्रौपदीला
घेऊन कुंतीकडे आलेला असून भिक्षा आणलीय असे म्हणून द्रौपदीची ओळख कुंतीला
करून देत आहेत. तर त्याच्या बाजूला डावीकडे व्यास मुनी हे द्रौपदीचा पाच
पतींशी विवाह कसा समर्थनीय आहे हे कुंतीला पटवून देत आहेत असे वाटते.
ह्याच्याच खालच्या बाजूला कृष्ण आणि कुंतीसह इतर पांडवांची भेट दाखवलेली आहे.
१०. द्रौपदीस्वयंवर (डावी बाजू)
याच्या शेजारचा एक पट मात्र द्रोणपर्वातील आहे जो आपण नंतर पाहू.
सुरुवातीला आधी आपण भीष्मपर्वातील पट पाहू ज्यात भीष्मवधाचा प्रसंग कोरलेला
आहे. हा पट नंदीमंडपाच्या समोर असलेल्या सभामंडपाच्या उजव्या बाजूने सुरु
होतो.
हा शिल्पपट सुरु होतो अर्जुन भीष्म यांच्या युद्धापासून. ह्या
शिल्पपटांछ्या रथींच्या प्रतिमा भंग झाल्यात पण त्यांच्या ध्वजांवरुन ते
योद्धे अगदी सहजी ओळखू येतात.
ह्या पटात अर्जुन भीष्माशी शरयुद्ध खेळत आहे. सारथी कृष्ण चततुर्भुज
विष्णूरूपात असून अर्जुनाच्या ध्वजावर वानर आहे. तर त्याच्या समोर भीष्म
तालध्वजासह रथावर आरूढ आहे.
११. अर्जुन -भीष्म युद्ध
ह्याच्या पुढचा पट आहे तो भीष्म वधाचा.
कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात
जाऊन पांडव भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी
स्त्री असलेल्या शिखंडीशी मि युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे
शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात.
ह्या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन
आहे अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव
करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प
आहे.
१२. भीष्मवध
यांनंतर ह्याच्या उजवीकडचा जो शिल्पपट आहे तो आहे भीष्म शरशय्येचा.
भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक
व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली
म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
१३. भीष्म शरशय्या
यानंतरचा शिल्पपट आहे द्रोणपर्वातील. जो भीष्मपर्व आणि द्रौपदी स्वयंवर यामधील भागात आहे.
१४. द्रोणपर्व (संपूर्ण शिल्पपट)
यातील पहिल्या प्रसंगात एक द्रोणाचार्य आहेत हे निश्चित जे त्यांच्या
सुवर्णमय कमंडलू च्या ध्वजावरुन समजून येते. त्याच्याशी युद्ध करणारा
पांडवयौद्धा बहुधा खङगधारी दृष्टदद्युम्न किंवा मेष ध्वजधारी शिखंडी असावा.
१५. द्रोण व पांचालवीराचे युद्ध
ह्यानंतर कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून
कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही. ह्याच्या
पुढचे शिल्प मात्र अतिशय रोचक आहे. द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला
जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच
आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच.
एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत
मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या
पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
१६. अर्जुन- कौरववीर युद्ध
१७. भीम-गजयुद्ध
ह्याच्या बाजूलाच पट आहे तो शल्यपर्वातला.
ह्यात एक पांडवयोद्धा दाखवला असून तो मी ओळखू शकलो नाही. त्याच्या
ध्वजावर मनुष्याचे शिर आहे. असा ध्वजचिन्ह असलेला कुठलाही योद्धा मला
माहितीत नाही. द्रौपदेयांच्या ध्वजांवर चंद्र, सूर्य, यम आणि
अश्विनीकुमारांच्या प्रतिमा होत्या असा महाभारतात उल्लेख आहे पण तो ह्या
आकृतीशी जुळत नाही.
शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि
उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र
विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू
येतोय.
१८. शल्ययुद्ध
इथे भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट संपतात.
१. राम लक्ष्मण सीता :- इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस
आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा
जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले
गेले.
रामायणपटाचा
पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर. पायर्यांनजीकच्या उजवे
बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमा सुद्धा
बसवलेल्या आहेत. दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री
प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग
आहे याबद्दल यत्किंचितही शंका नाही, मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे
अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग
असावा.
२. रामायण अखंड शिल्पपट:- दुसरा
शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील
डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट
आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम लक्ष्मण
आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी
याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर
विरुद्ध बाजूस आपणास दिसतो.
मध्यभागी
जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. तसेच हा प्रसंग
सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच
राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध तदनंतर मिथिला
नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा, अशी शक्यता आहे. ३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) )
मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात. यातील
दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग
रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे
दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते
हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.
४. रामायण शिल्पपट यातील
एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला
आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या
खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर
अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे
दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे
जिकीरीचेच आहे.
रामायणातील सुप्रसिद्ध मारिचवधाचा प्रसंग सभामंडपात कोरला आहे.. ५. मारिचवध उजव्या
बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या
धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे. मरताना
रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित
झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही
संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा
मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.
श्रीराम वानरसेना घेऊन परतत आहेत (डावीकडून..)
हत्ती घेऊन भेटीला येत आहे अत्यंत प्रिय बंधू भरत...
६. अगम्य शिल्पपट ह्या
पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये
प्राणी दाखवलेले आहेत. एक अंदाज म्हणाल तर ह्यात सुग्रीवाच्या
किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल.
महाभारतातील काही शिल्पपट :-
महाभारतातील शिल्पपट रामायणातील शिल्पपटाच्या तुलनेत संपूर्ण आणि सलगपणे
बर्यापैकी अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा
सभापर्वातील आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व
आणि शल्यपर्व ह्या पर्वांमधील आहेत. रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.
१. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट:- यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे. द्रुपदाच्या
डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला
आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की येथील
शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते.
कृष्णाच्या
डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा
मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील
लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन
द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण
करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे
ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला
घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.
२. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू) या
मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत
असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे.
अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
रथावर आरूढ कृष्ण आणि अर्जुन..
द्रूष्टदुन्म्य आणि पांडव कथा
३. अर्जुन -भीष्म युद्ध :- कितीही
प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव
भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री
असलेल्या शिखंडीशी मी युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे
शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात.
ह्या पटात
डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे
अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना
दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.
पितामह भीष्म मृत्यूशय्येवर असताना त्यांना भेट देणारे पांडव.... ४. भीष्म शरशय्या:- भीष्म
हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त
करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून
भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
५. अर्जुन- कौरववीर युद्ध:- कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही.
घटोत्कच युद्ध..
.
गजयुद्धः भीम हत्ती उचलून फेकून देतांना.
गजयुद्ध
– महाभारतात माणसांना माणसे भिडली होती, योद्धांना योद्धा, महापुरुषांना
महापुरुष, अमर आत्मांना अमर आत्मा आणि गजांना दुसरे तुल्यबळ गज
६. भीम-गजयुद्ध द्रोणपर्वात
अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात
घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच. एकेक
करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत
मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या
पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
७. शल्ययुद्ध शल्याचा
वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा
नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला
कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय.
हे
शिल्पपट पौराणिक आणि रामायण , महाभारत यांची अनमोल माहिती देतात. असे हे
दुर्मिळ शिल्पपट रामायण आणि महाभारताचा सखोल अभ्यास असेल तर अत्यंत
बारकाईने निरीक्षण केल्यानंतर काही अंशी तर ओळखता येतात.
ह्याव्यतिरिक्त भुलेश्वर मंदिरातील काही आगळीवेगळी शिल्पे आहेत. यापैकी
येथील छतांवर असलेली मातृकांची शिल्पे सर्वपरिचित असल्याने मी येथे त्याची
पुनरुक्ती टाळत आहे. मात्र मंदिराच्या मागच्या डाव्या बाजूचे भिंतीवर
चामुंडेचे एक भग्नावस्थेतील अप्रतिम शिल्प आहे.
प्रेतवाहिनी चामुंडा अस्थिपंजर देहासह उभ्या स्थितीत असून तिचा चेहरा
भयानक आहे. ओठांतून दाढा बाहेर आल्या असून तिच्या पोटात विंचू आहे जो
तिच्या राक्षसी भुकेचे प्रतिक आहे. पायांतळी प्रेत आहे.
इथल्या माझ्या सर्वाधिक आवडीच्या शिल्पांपैकी हे एक.
१९. चामुंडा
ह्या शिवाय भुलेश्वर मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणाजे इथे इतके
स्तंभ असूनही फक्त स्तंभाच्या मधल्या चौकटीवर शिल्प आहे. इतर सर्व
स्तंभचौकटी ह्या शिल्पविरहीत आहेत.
ह्या चौकटीवर नर्तिक नृत्य करत असून दोन्ही बाजूंना वादक वादन करत आहेत.
२०. स्तंभचौकटीवरील एकमेव शिल्प
भुलेश्वर मंदिरातील अजून रोचक शिल्प म्हणजे एक आभासी शिल्प.
ह्यात तीन पुरुष असून ते एकमेकांना जोडलेले आहेत. आणि पाय मात्र चारच
आहेत. म्हणाजे प्रत्यक्षात एकाच वेळी दोन पुरुष उभे असून ते पाय एकमेकांना
जोडले असल्याने तिघा जणांचा आभास निर्माण करीत आहेत. हे अतिशय भग्न शिल्प
असले तरी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्वपरिचय असल्याने हे शिल्प ओळखू
येतेय. चांगल्या अवस्थेत असताना हे शिल्प अतिशय देखणॅ असणार यात काहीच शंका
नाही.
अशीच शिल्पे मी पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आणि पिंपरी दुमाला येथील सोमेश्चर येथील यादवकालीन मंदिरांत पाहिली आहेत.
२१. आभास निर्माण करणारे शिल्प
तुलनेकरीता अनुक्रमे ह्या पेडगाव आणि ह्या पिंपरी दुमाला येथील ह्या प्रतिमा बघा २२.
२३.
आणि जाता जाता माझ्या सर्वाधिक लाडक्या हिच्याशिवाय भुलेश्वर वारी कशी काय पूर्ण होईल.
ही
पिंड, ह्या पिंडीच्या खाली पुन्हा पिंडी आहेत, तसेच या पिंडीला असणा-या
छिद्रातुन भुंगे बाहेर येउन त्यांनी यवन सॅन्याला पळबुन लावल्याच्या कथा हे
पुजारी सांगतीलच.
मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील बाजूस वर तीन स
गाभाऱ्यासमोर आहे स्वंतत्र नंदीमंडप. नंदीमंडपातील नंदीची मूर्ती सुस्थित असून मूर्तीवरील कोरीवकाम अप्रतिम आहे. नंदिमंडप आकाराने लहान असला तरी मंडपातील खांबांवर आकर्षक नक्षी काम आहे. नंदीमंडपातील खांबांच्या अग्रभागी यक्ष कोरलेले आहेत. मंदिरात जागोजागी हंस, लतावेल, मकर आणि कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात. मंदिरात ब्रम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे. मातृकांची आयुधे आणि वाहने स्पष्ट कोरलेली आहेत. मातृकानंतर रेलचेल आहे ती नृत्यांगना, वादक आणि सूरसुंदरींची. मंदिरात महाभारत आणि रामायण यांचे भव्य शिल्पपट आहेत. रामायणातील शिल्पपटात राम-भारत भेट, सीता स्वयंवर, तसेच सीता विवाहप्रसंगी करतात तो गौरीहरपूजन हा सोहळा दाखवला आहे. या शिल्पातील सीतेच्या भावमुद्रा, तिचे आणि सख्यांचे अलंकार, तोरणे नुसती बघतच राहावीत. महाभारतातील शिल्पपटात अर्जुनाचा मत्स्यभेद, कौरव-पांडव युद्ध, भीष्म बाणांच्या शय्येवर दाखवले आहेत, भीम गदेने हत्तींना मारत आहे, इ. अनेक प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिराच्या बाह्यभागात दगडी घंटेची आरास आहे. हि सर्व शिल्प बघत असताना एक गोष्ट नजरेत पडते ती म्हणजे या शिल्पठेव्यातील एकही मूर्ती अखंड नाही आहे. निष्टुर मूर्तीभंजकानी इथली मूर्तींवर घणांचे घाव घालून कोणाचे हात, कोणाचे कान, कोणाचे मस्तक आणि कोणाचे दोन्ही पाय तोडलेले आहेत. मूर्ती अखंड नसल्या तरी मूर्तींचे शिल्पसौंदर्य कमी होत नाही. विनायकी गणेश भुलेश्वर मंदिरात आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे ते म्हणजे गणपतीचे. आपण नेहमी गणपतीला पुरुषरुपात पाहतो, पण येथील गणपती स्त्रीरूपात आहे. हा गणपती विनायकी किंवा लंबोदरी, गणेश्वरी किंवा गणेशानी, विनायकी गणेश इ. नावानी ओळखला जातो. स्त्रीरूपातील गणेशाचे पाटेश्वरनंतर भुलेश्वर हे दुसरे ठिकाण आहे. विनायकी गणेशाचे दोन शिल्पपट भुलेश्वर मंदिर आहेत. या दोन्ही शिल्पपटात गणेशानी आणि दोन मातृकांच्या बाजूने भगवान महावीरांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या दोन्ही शिल्पपटातील गणेशानी पद्मासनात आसनस्थ असून चारी हातात आयुधे धारण केलेली आहेत. पायाजवळ मूषक हे वाहनही कोरलेले आहे. पुण्याचे वेरूळ शोभणाऱ्या भुलेश्वर एकदातरी भेट देऊन तेथील विनायकी गणेश आणि इतर अनेक शिल्पकृतींचे दर्शन घेतलेच पाहिजे. अखंड नसलेल्या तरीपण अप्रतिम वाटणाऱ्या ह्या शिल्पकृती बघताना त्या निर्माण करणाऱ्या अनेक अज्ञात कारागिरांना प्रणाम करण्यासाठी आपले हात आपोआप जोडले जातात.
आता सुरु झाला नजरभेट ते ज्ञानभेट हा प्रवास.....एक एक शिल्प बारकाईने
पाहून त्यामागची त्याची कथा भावार्थ समजून-उमजून घेण्याचा प्रवास...
रामायणातील श्रीराम-भरत मिलाप दृश्य साकारणारे हे सुरेख शिल्प...
you
get inside, the entrance hall has small Hanumaan idol welcoming you to
the temple. Entrance to the Vigraha is decorated by a decorative door
frame with Shalabhas, heavenly Swans and kirti Mukhas. If you stand
straight facing the Hanumaan , it seems the temple has ended, its time
to go home. But when you step inside the Hanumaan room, two stairs go
upwards on both hands, leading you to the main temple.
As
you climb the stairs, first thing you see are the many beautifully
carved pillars on which the temple towers have been erected. As you get
use to the darkness, you came to know, almost all of the building space
have been efficiently used to do some brilliant carvings. Carvings
portray some known and many unknown stories from Puranas, Ramayna and
Mahabharata.Next to the hidden stairs, there is a Nandi mantapa
(Pillared pavilion) with some ornate pillars.
Nandi
is a main door keeper of Mahadev, who is sitting there, focusing all of
his attention to the lord. He is teaching us how one should focous on
Parmeshwar, with all the dedication. Here, in the Bhuleshwar temple, the
monolith Nandi is ornated with some serious jewelry works, competing
with the pillars under which it is resting.
There
is ArdhaMandapa or half pavilion in between Nandi and sanctum. Here,
along with the pillars, even roof is packed with carvings. Yaksha are
holding the roof, seating on the pillars. Brahma Vadinis, or celestial
musicians are carved and elegantly place on the dome. Most of them are
destroyed, but what is remained gives you the idea of their beauty. You
can see Kirti Mukhas carved on pillars. A giant copper trishul
(Trident), a weapon worthy only to gods, is kept in corner, ready to be
wielded by Mahadev. As you cross this sub pavilion, few steps downwards
take you to main Sanctum.
Bhuleshwar Garbhagruha
Door
frame is carved out of black stone where Sapta matrika, Ganesha and
apsaras are gathered, to greet Mahadev. Intricate design in between
these gods fill up the remaining space of the frame. Bow your head, and
enter through that narrow passage. Over the frame, you can see five
sages, standing atop, with turrets over their heads adding an incredible
symmetry to the whole door frame. Actual sanctum is plane simple room,
without any carvings. It helps you focus on the god without any
distractions. Shiva in Lingam form stays here, with an giant five headed
cobra coiled around it. Khandoba, being one of the incarnation of Lord
Shiva is also present here, in the mask form.
Get
the lord’s blessing and get out of the room, walk towards
circumambulation path around three towers. There is a gap in between
pradakshina path and outer wall of sanctum, where open skies and sun
plays the game of shadows on the beautiful carvings on the walls.
Pathway of the Bhuleshwar temple is made up of the similar stones, with
roof, pillars, few smaller size shrines of other deities, stone mesh
windows in between and all of that with brilliant carvings. Outside of
sanctums are decorated with deities, handsome Aandharvas and gorgeous
Apsaras. Apsaras, expert in the art of dancing and singing, have been
carved here with elegance, radiating with their youthful energy. Few
interesting and rare idols like Vainayaki, or Gamesh in female form can
be seen over here.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच
प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले.
निव्वळ शब्दातीत.
या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.
मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवर आहे. फरसबंद आवाराजवळ आणखीन एक मंदिर आहे. आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूना प्रवेशद्वारे आहेत. मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवर आहे.
या दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या सहाय्याने हवा खेळती ठेवली आहे. शिवाय आतील बाजूस उतुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा ऐन उन्हाळ्यातही टिकून असतो. हा सभामंडप मुख्य मंदिरापासून वेगळा करणारी आडवी भिंत आत आहे. अश्या आद्य भिंतीची रचना डोंगरी किल्ल्यावर आत येणाऱ्या शत्रूला चकवा देण्यासाठी केलेली असते. या आडव्या भिंतीमुळे पुढचा मार्ग दिसत नसल्यामुळे नवखा माणूस गोंधळून जातो. पण काळजीपूर्वक बघितल्यास याच अंधारी भागात डाव्या-उजव्या बाजूला वर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसतात. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर काय बघायचे आणि काय नाही बघायचे अशी आपली अवस्था होते. या मंदिरात आपल्याला कोरीव कामाशिवाय काहीही दिसत नाही. मंदिरात एकही कोपरा किंवा भिंत कलाकृतीशिवाय दिसणार नाही.
कोण म्हणते भूलेश्वर देऊळ बाहेरून साधारण आहे. हे पेशवेकालीन बांधकामही खूप काही सांगून जाते. जसे की याची रचना इस्लामिक वास्तूची आहे कारण इथे मिनार दिसतात.
हा पोट फाडणारा सुंदररीत्या कातरलेला नरसिंह बाहेरच आहे हं
ही एका मुसलमानांची आकृतीही हिंदू देवतांच्या खांद्याला खांदा लावून उभी दिसते.
नरसिंहाच्या बाजूलाच देवी आणि गणपती लपा छपी खेळताना दिसतात
हा तो सुंदर खांब ज्यात अनेक देवतांनी घर केले आहे
घंटा होती तर भली मोठी, आणि भला मोठा आवाज ही करत होती, पण ही पोर्तुगीज नाही
हे सुंदर सजवलेलं कासव देवळाच्या दरवाज्याबाहेर आपल्या पाठीवर आमच्यासारख्या अनेकांचे ओझे रोज वाहवत असणार
बाहेरची भिंत ओलांडून देवळाच्या आत शिरल्या शिरल्या अद्भुततेची पहिली झलक मिळते. उग्र डोळ्यांच्या अजस्त्र नंदीने आमचे स्वागत केले. असा मोठा नंदी मी हैदराबाद मध्ये असताना तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये बरेच पहिले आहेत पण महाराष्ट्रात प्रथमच पाहत होतो.
मुख्य देवळाच्या बाहेरची भिंत – महाभारतातील युद्धाची नांदी सुरुवातीलाच सुरु होते. पण हे माझ्या नजरेस पडले तेव्हा शंतनूची महाभारत वाणी सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता, त्यामुळे मला हे हरप्पन काळातील बैल गाडी असावी असे वाटले.
हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो. या मंदिरात प्रवेश करताक्षणीच लाजवाब, भारी, खूपच सुंदर..असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते. मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभुषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल. नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची सुरेख िपडी आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट कोरलेला दिसून येतो. या शिल्पकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे पाहू आणि किती पाहू यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं स्त्रीरूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
दर्शन घेऊन निघताना नजर खिळवून राहिली ती सभामंडपातील अत्यंत सुरेख, सुबक, आकर्षक, अवाढव्य नंदिशिल्पाकडे!
सूर्यकिरणांचा
अभिषेक थेट शिवपिंडीवर व्हावा म्हणून नंदीने आपले मुख किंचित वळवले ! कथा
हे सांगते. पण त्यामागचा भावार्थ आपण घेऊ तसा..शिवपिंड आणि रविकिरण
यांच्या मधे येणारा मी कोण? किती ही उदात्त भावना....
हे
कासव इथे कसे आले? की आधीच इथे होते? ह्या पेक्षाही मला भावले तो त्याची
मन लुभावणारी प्रतिमा....अतिभव्य, सुरेख, सुबक आणि सुरचित.....कासवासारखे
नतमस्तक, शरणागत होत, अध्यात्मिक उन्नती हा एकच भावार्थ मनी ठेवत शिवाचे
दर्शन घ्यावे असेच तर नाही ना संदेश देत हे कासव?
सप्तमातृका ह्या देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृका ह्या पुरुष
देवतांच्या शक्ती असल्यामुळे त्या मूर्ती स्त्री रुपात घडवल्या गेल्या.
ब्रम्हाची ब्राम्ही/ब्रम्हाणी, इंद्राची इंद्राणी.एन्द्री, महेशाची
माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची
चामुंडा ह्या त्या सप्तमातृका! हातात आयुधे आणि हस्तमुद्रा या रुपात त्या
आढळतात.
योगिनी, वैनायकी यांचे संदर्भ पुराणात आढळतात.
वैनायकी ही विनायकाची स्त्री रुपी प्रतिमा..
वैनायकी ला गणेशानी, लंबोदरी, विघ्नेश्वरी, स्त्री-गणेश असे देखील म्हणतात.
गजवदना वैनायकीच्या आसनासमोर मूषक आहे. हातात दंड, अंकुश आणि मोदकपात्र
आहे. डावीकडे वळलेली सोंड असून तोंडात हस्तीदंत आहेत. गळ्यात हार, हातात
कंकणे आणि पायात नुपूर आहेत.
खालील शिल्पपटात गरुडावर आरूढ वैष्णवी (उजवीकडील) दिसत आहे...
ह्या असंख्य शिल्पाप्रमाणेच उलटे नाग असलेली यादवकालीन बांधकाम रचना येथे आहे.
मंदिराच्या बाहेर चक्कर मारली तर ढवळगड, पुरंदर, मल्हारगड किल्ले इथून दिसतात.
मंदिर बाहेरून बघितले तर आतल्या शिल्पवैभवाची सुतराम कल्पना येणार नाही असे
हे भुलेश्वर मंदिर! मंदिराची सफर करताना नजरभेट चे रुपांतर ज्ञानभेटीत तर
झालेच परंतु सतत शिल्पवैभवा पाठील हात स्मरणात येत राहिले. एक हात ज्यांनी
शिल्पांची तोडफोड केली आणि एक हात ज्यांनी ह शिल्पे घडवली!
सलाम त्या शिल्पकारांना ज्यांच्या सिद्धहस्त चमत्कारातून ही भुरळ पडणारी शिल्पवैभव निर्मिती झाली!
.
महानंदी
मुख्य मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते महानंदीचे. मंदिराच्या
मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. प्रत्येक अन
प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही
भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक डिटेल काम पाहून डोके
चक्रावून जाते.
महाभारतातील अर्जुन-कर्ण युद्धाचा प्रसंग.
युद्ध दर्शवताना हवेत मारलेले बाणही स्पष्ट दिसतात.
आकृत्या होत्या त्या शंतनू आधी ओळखून दाखवल्या
आता डोळे या पुढच्या मंदिरच्या भव्यतेच्या तयारीत असतांत्,आणि ती अशी आहे. मी फार लिहित नाही या छायाचित्रांनाच बोलु देत.
सुरसुंदरी – देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर पुढच्या व मागच्या बाजूला महाभारतातील काही मुख्य प्रसंग कोरले आहेत. दोन्ही बाजूंच्या भिंतींवर आहेत सुंदर सुंदर आकृत्या ज्यांना सुरसुंदरी म्हणतात. प्रत्येकीच्या हातात कोणते ना कोणते वाद्य आढळते म्हणून ‘सूर’ आणि अर्थात झाडून पुसून सर्व पुरातन देवळात स्त्रीचे रूपहे सुंदरच कोरलेले आढळते, म्हणून ‘सुंदरी’
पाय काय आणि नाय काय – बघितले तर नुसतेच पाय. जरा वर बघितले तर नुसताच सुंदरीचा चेहेरा. मधला भाग खिलजीने निखाळलेला!
for bikes and cars. buses can be park carefully. Free Parking.
Food : Packed food and water bottles are available on small stall. Full meal is available only one special festivals of lord Shiva.
Entry Fee : There is nominal entry charges are taken by per vehicle Rs. 10 to 50.
ut.
कलारसात भुलवणारं भुलेश्वर! |
5-6 minutes
गड-कोटांचे संवर्धन हा जसा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे
तसाच तो जिव्हाळ्याचाही बनला आहे. महाराष्ट्रातले नेमके गड-कोट किती?
यापेक्षा त्यातले सुस्थितीत किती? हे प्रश्न आपल्या स्वाभिमानी मनाला जास्त
टोचतात. याला कारणच तसं आहे म्हणा! महाराष्ट्राच्या मातीला या गड-कोटांवरच्या
इतिहासाचा नेहमीच अभिमान वाटत आलाय; परंतु आपल्या सर्वाच्या
नाकत्रेपणामुळेच आणि दुर्लक्षितपणामुळेच एकेकाळी वैभवात नांदणारे गड-किल्ले
आज उपेक्षिताचे जीवन जगत आहे. एकेकाळी मराठी सत्तेचा कारभार पाहणारे
बहुतांशी किल्ले तर अगदी शेवटची घटका मोजत आहेत. यापैकी काही तर नामशेष
झाले सुद्धा! अस्तित्व संपलेल्या या किल्ल्यांना अक्षरश: कागदातूनच शोधावे
लागणार आहे, यात शंका नाही. असाच एक इतिहासकालीन पुण्याजवळील किल्ला
पूर्णत: नामशेष झाला असून हा किल्ला आता केवळ डोंगर म्हणनूच उभा आहे.
दौलतमंगळ असं याचं देखणं नाव!
हा
दौलतमंगळ अक्षरश: शेवटची घटका मोजत कसाबसा उभा आहे. या किल्ल्याच्या
बाबतीत समाधानाची एकच गोष्ट म्हणजे, या किल्ल्यात असलेलं एक प्राचीन आणि
तितकंच सुंदर शिवमंदिर अजूनही तग धरून आहे. म्हणूनच या डोंगरावर अनेक
शिवभक्त शंकराच्या िपडीच्या दर्शनासाठी येत असतात, पण बहुतेकांना येथेच एक
किल्ला होता असे म्हटले तरी पटणार नाही इतकं भीषण वास्तव या किल्ल्याच्या
बाबतीत इथं घडलंय.
ब-याचदा फिरायला जायचे कोठे, त्याचे अंतर किती या प्रश्नांचा गुंता
सोडवता-सोडवता आपले भटकणे राहून जाते. आणि नपेक्षा काहीतरी-कोठेतरी फिरूच
म्हणून गजबजलेली ठिकाणे पाहिली जातात. म्हणूनच आपल्या इतिहासाचा जर अभ्यास
आणि वाचन केले तर काही सुंदर नावे नक्कीच आपल्यासमोर येतील. दौलतमंगळचा
डोंगर हे याच पंक्तीत भर घालणारं नाव आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतच्या अलीकडे उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. हा
फाटा थेट माळशिरस नावाच्या गावात जातो. या गावात आलो की, एक डोंगर
आपल्यासमोर ठाण मांडून उभा असतो. हा डोंगर जसजसा जवळ करू लागतो, तसतसं या
डोंगराचा पडदा बाजूला होऊ लागतो. समोर येणारे बुरूज, दर्गा, तटबंदीचे
अवशेष, पायरीमार्ग हे समोर येऊ लागतात. अन् मग आपल्या लक्षात येऊ लागते की,
येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता. खरंच आहे हे. हा डोंगर म्हणजेच
पूर्वीचा दौलतमंगळ किल्ला! विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी सन १६३४मध्ये
बांधल्याची नोंद मिळते. हा गड इतिहासात काही प्रसिद्ध पावला नाही किंवा
यावर काही घडामोडीही घडल्या नाहीत; पण हा किल्ला आपल्या उदासीनतेचं आणि
दुर्लक्षतेचं एक सुंदर प्रतीक ठरला. कारण हा किल्ला आता पूर्णपणे नामशेष
झाला आहे. याची खंत ना कोणालाच.. असो याचे अवशेष पार करत आपण डोंगरावर आलो
की मग भुलेश्वरचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर घेऊन उभं असल्यासारखं
वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसंजसं जवळ येऊ तसंतसं अधिकच खुलताना वाटू
लागतं.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने
संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच
द्वारपाल जय-विजय, पाय-यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत.
हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा खालचा भाग
हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची
बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते.
शिखरावरील चुन्याच्या बांधकामावर गणेश, विष्णू आदी देवतांची शिल्पे कोरलेली
दिसून येतात. हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ
मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते.
यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून
मूळ मंदिरात प्रवेश करतो.
या मंदिरात प्रवेश करताक्षणीच आतापर्यंत काबूत ठेवलेल्या आपल्या ओठातून
लाजवाब, भारी, खूपच सुंदर.. असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल!
एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते.
मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून,
मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभूषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा
लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल.
नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची
सुरेख िपड आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच
भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाहय़ िभतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट
कोरलेला दिसून येतो. या शिल्पाकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच
देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली
घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे
पाहू आणि किती पाहू.. यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या
शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं
स्त्रीमध्ये दाखवलेलं रूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र
आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते? समाधान, विरंगुळा, ऊर्जा,
मनाला छेडणारी तार.. हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या
मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा
अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या
सौंदर्यतेच्या मापदंडाचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा
आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसुकच या सौंदर्यतुषारात
भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात ‘भुलवून’ सोडणारं हे
भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा.
औरंगाबाद
नुसते उच्चारले तरी लगेच वेरूळचे कैलासलेणे, अजिंठा लेण्यातील चित्रे,
देवगिरीचा किल्ला आणि घृष्णेश्वर मंदिर हि पर्यटकांनी गजबजलेली ठिकाणे
आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. तशीच पर्यटकांनी गजबजलेली अनेक ठिकाणे
पुण्याच्या आहेत, उदा. बनेश्वर, सिंहगड, तोरणा, वढू-तुळापुर, शिवनेरी,
भीमाशंकर, इ. पण ह्या सर्व ठिकाणहून वेगळे असे पाहायचे असेल तर आपल्याला
आपली पाऊले पुणे-सोलापूर महामार्गावरील भुलेश्वरला वळवायला लागतील.
ज्याप्रमाणे वेरुळचे कैलासलेणे, तसेच यवतेश्वरच्या माथ्यावर वसलेले
भुलेश्वरचे शिवमंदिर.
पुणे-सोलापूर
महामार्गावर पुण्यापासून साधारणपणे ५५ कि.मीवर भुलेश्वर हे यवतेश्वर
टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर यादवकाळात साधारणपणे बाराव्या शतकात मध्ये
बांधलेले आहे. पण मूर्तिभंजक आक्रमकांनी मंदिर आक्रमण करून मंदिर उद्धवस्त
केले व नंतरच्या काळात पुन्हा बांधले असावे (कारण मंदिराचे प्रवेशद्वार
शिवकालीन गोमुखी प्रकारचे असून १३ व्या शतकात अश्या गुप्त दरवाज्याची काहीच
गरज नव्हती, तसेच काही ठिकाणी भाजलेल्या विटांचा वापर केलेला आहे).
भुलेश्वर मंदिराला दौलत मंगल किल्ल्याने आपल्यात सामावून घेतले आहे. हा
किल्ला आदिलशाहाचे सरदार मुरार जगदेव यांनी बांधला आहे. काळाच्या ओघात दौलत
मंगल किल्ला उद्धवस्त झाला, पण भुलेश्वर मंदिर सर्व आक्रमणांना तोंड देत
उभे राहिले. दौलत मंगल किल्ल्याचे काही बुरुज आणि प्रवेशद्वार अजूनही साबूत
आहेत.
पुण्याहून
सोलापूरला जाताना यवतच्या अलीकडे दोन कि.मी अंतरावर भुलेश्वर फाटा आहे.
भुलेश्वर डोंगराकडे जाणारा हा रस्ता दोरगेवाडीनंतर एकदम मोकळा आहे. मधूनच
एखादे वाहन गेले तर, नाहीतर ह्या रस्त्याने जाणारी वाहने फार कमी. पावसाळा
सोडला तर हा परिसर तसा रुक्ष. दोरगेवाडीतूनच डोंगरमाथ्यावरील भुलेश्वर
मंदिर आणि त्याशेजारी असलेला दूरसंचार विभागाचा मनोरा आपल्याला खुणावत
असतात. महामार्गापासून सुमारे १०कि.मीचे अंतर पार केल्यानंतर आपण भुलेश्वर
डोंगराच्या पायथ्याशी येतो आणि इथून पुढे सुरु होतो वळणावळणाचा कठीण घाट.
घाट पार केल्यानंतर आपण माथ्यावर असलेल्या पठारावर येऊन पोहोचल्यानंतर आपले
लक्ष वेधून मंदिराचे कळस आणि दौलत मंगळ किल्ल्याचे मागे उरले अवशेष.
मंदिराकडे जाताना मंदिराच्या खालच्या अंगाला असलेल्या घळीत ताशीव दगडात
बांधलेले प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून जाणारा पायऱ्यांचा रस्ता हा
बहुधा जुन्या काळातील किल्ल्यावर जाणारा मुख्य मार्ग असावा.
प्रवेशद्वाराच्या जवळच थंडगार पाण्याचे टाके आहे.
भूलेश्वर
मंदिर भव्य असून, एका पठारावर उभारले आहे. मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच
चौथऱ्यावर केली आहे. पठारावर वाहने उभी करण्यासाठी भरपूर जागा असून,
मंदिराच्या मागच्या बाजूस दूरसंचार विभागाचा मनोरा आहे. चौथऱ्यावर प्रवेश
करायच्या आधी असलेल्या पायऱ्यांच्याइथे असलेल्या द्वारपालांच्या मुर्त्या
आपले लक्ष वेधून घेतात. शिल्पकाराने द्वारपालांच्या अंगावर असलेले दागिने
फार उत्तम कोरले आहे. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी वाघ हत्तीवर
आक्रमण करीत आहे असे शिल्प कोरले आहे. मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा
टांगलेली आहे.
मंदिर
पूर्वाभिमुख असून नागर शैलीत बांधलेले आहे. मंदिर गर्भगृह, अंतराळ, सभामंडप
आणि नंदीमंडप असे चार भागात विभागेले आहे. मंदिराचे शिखर विटांचे असून ते
नंतरच्या काळात बांधले असावे. शिखरावर अनेक पौराणिक प्रसंग, देवादिकांच्या
मूर्ती आणि विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत.
मंदिरासमोर
प्रशस्त फरसबंद आवर आहे. फरसबंद आवाराजवळ आणखीन एक मंदिर आहे. आवारातून
दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूना प्रवेशद्वारे आहेत. या दगडी
मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या सहाय्याने हवा खेळती ठेवली आहे.
शिवाय आतील बाजूस उतुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा ऐन
उन्हाळ्यातही टिकून असतो. हा सभामंडप मुख्य मंदिरापासून वेगळा करणारी आडवी
भिंत आत आहे. अश्या आद्य भिंतीची रचना डोंगरी किल्ल्यावर आत येणाऱ्या
शत्रूला चकवा देण्यासाठी केलेली असते. या आडव्या भिंतीमुळे पुढचा मार्ग
दिसत नसल्यामुळे नवखा माणूस गोंधळून जातो. पण काळजीपूर्वक बघितल्यास याच
अंधारी भागात डाव्या-उजव्या बाजूला वर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसतात.
पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. मुख्य मंदिरात
प्रवेश केल्यानंतर काय बघायचे आणि काय नाही बघायचे अशी आपली अवस्था होते.
या मंदिरात आपल्याला कोरीव कामाशिवाय काहीही दिसत नाही. मंदिरात एकही कोपरा
किंवा भिंत कलाकृतीशिवाय दिसणार नाही.
मंदिराच्या
आतील तिन्ही बाजूना ओवऱ्या असून त्यांच्यावर शिल्पे कोरली आहेत.
मंदिराच्या मध्यभागी गर्भगृह असून गाभाऱ्यात शंकराची रेखीव पिंड आहे.
पिंडीजवळ पितळेची नागमुर्ती आहे. पिंडीसमोर असलेल्या खळग्यात भक्तिभावाने
प्रसाद ठेवल्यास प्रसादाचा काही भाग देव ग्रहण करतो अशी भक्तांची श्रद्धा
आहे. गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूस कीर्तिमुखे कोरलेली आहेत.
शंकराचे
दर्शन घेऊन आपण जेव्हा सभामंडपात येतो तेव्हा काय बघू आणि काय नको अशी आपली
अवस्था होते. सभामंडपाच्या तिन्ही बाजूना कोरीव कामची लयलूट आहे.
सभामंडपात एकही असा मोकळा भाग नसेल जिथे कोरीव काम नाही आहे. गाभाऱ्यासमोर
आहे स्वंतत्र नंदीमंडप. नंदीमंडपातील नंदीची मूर्ती सुस्थित असून
मूर्तीवरील कोरीवकाम अप्रतिम आहे. नंदिमंडप आकाराने लहान असला तरी मंडपातील
खांबांवर आकर्षक नक्षी काम आहे. नंदीमंडपातील खांबांच्या अग्रभागी यक्ष
कोरलेले आहेत. मंदिरात जागोजागी हंस, लतावेल, मकर आणि कीर्तिमुख इ. प्रतिमा
आढळतात. मंदिरात ब्रम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी,
वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे. मातृकांची आयुधे आणि
वाहने स्पष्ट कोरलेली आहेत. मातृकानंतर रेलचेल आहे ती नृत्यांगना, वादक आणि
सूरसुंदरींची.
मंदिरात
महाभारत आणि रामायण यांचे भव्य शिल्पपट आहेत. रामायणातील शिल्पपटात
राम-भारत भेट, सीता स्वयंवर, तसेच सीता विवाहप्रसंगी करतात तो गौरीहरपूजन
हा सोहळा दाखवला आहे. या शिल्पातील सीतेच्या भावमुद्रा, तिचे आणि सख्यांचे
अलंकार, तोरणे नुसती बघतच राहावीत. महाभारतातील शिल्पपटात अर्जुनाचा
मत्स्यभेद, कौरव-पांडव युद्ध, भीष्म बाणांच्या शय्येवर दाखवले आहेत, भीम
गदेने हत्तींना मारत आहे, इ. अनेक प्रसंग कोरलेले आहेत.
मुख्य
मंदिराच्या बाह्यभागात दगडी घंटेची आरास आहे. हि सर्व शिल्प बघत असताना एक
गोष्ट नजरेत पडते ती म्हणजे या शिल्पठेव्यातील एकही मूर्ती अखंड नाही आहे.
निष्टुर मूर्तीभंजकानी इथली मूर्तींवर घणांचे घाव घालून कोणाचे हात, कोणाचे
कान, कोणाचे मस्तक आणि कोणाचे दोन्ही पाय तोडलेले आहेत. मूर्ती अखंड
नसल्या तरी मूर्तींचे शिल्पसौंदर्य कमी होत नाही.
विनायकी गणेश
भुलेश्वर
मंदिरात आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे ते म्हणजे गणपतीचे. आपण नेहमी
गणपतीला पुरुषरुपात पाहतो, पण येथील गणपती स्त्रीरूपात आहे. हा गणपती
विनायकी किंवा लंबोदरी, गणेश्वरी किंवा गणेशानी, विनायकी गणेश इ. नावानी
ओळखला जातो. स्त्रीरूपातील गणेशाचे पाटेश्वरनंतर भुलेश्वर हे दुसरे ठिकाण
आहे. विनायकी गणेशाचे दोन शिल्पपट भुलेश्वर मंदिर आहेत. या दोन्ही
शिल्पपटात गणेशानी आणि दोन मातृकांच्या बाजूने भगवान महावीरांच्या मुर्त्या
कोरलेल्या आहेत. या दोन्ही शिल्पपटातील गणेशानी पद्मासनात आसनस्थ असून
चारी हातात आयुधे धारण केलेली आहेत. पायाजवळ मूषक हे वाहनही कोरलेले आहे.
पुण्याचे
वेरूळ शोभणाऱ्या भुलेश्वर एकदातरी भेट देऊन तेथील विनायकी गणेश आणि इतर
अनेक शिल्पकृतींचे दर्शन घेतलेच पाहिजे. अखंड नसलेल्या तरीपण अप्रतिम
वाटणाऱ्या ह्या शिल्पकृती बघताना त्या निर्माण करणाऱ्या अनेक अज्ञात
कारागिरांना प्रणाम करण्यासाठी आपले हात आपोआप जोडले जातात.
http://www.shivbharat.com/2015/09/shivkalin-kumbhamela.html शिवकालीन 'सिंहस्थ' समुद्र मंथनातून आलेले अमृत प्राप्त
यवत येथील भुलेश्वर मंदिर
यवत येथील भुलेश्वर मंदिर तसेच साधेच आहे. अर्धकुला मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा त्याचा तलविण्यास आहे. या मंदिरासमोर नंदी मंडप आहे पण या मंदिराचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या सीमा भिंतीला जोडून असलेल्या देव कुली का होत. मुख्य मंदिराच्या गर्भगृहावरील आणि मंडपावरील शिखर आज शिल्लक नाही. गर्भगृह आणि अंतराळ यांच्या भयांगावर एकूण पाच देवकुष्टे आहेत. या देवकुष्टापैकी तीन देव गोष्टी गर्भगृहाच्या तीन भद्रावर असून अंतराळाच्या बाह्य अंगावर प्रत्येक बाजूस एक असे दोन देवकुष्टे आहेत. अर्ध खुल्या मंडपावरील वेधिबंधावर नेहमीप्रमाणे अलटून पालटून आकृती शिल्पे येण्याऐवजी फक्त दोन भूमी समांतर थर आहेत. यातील खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराण कथा मधील दृश्य कोरलेली आहेत
सीमा भिंती लगत देवकुलिकांची रांग असणे हा स्थापत्यप्रकार पश्चिम भारतात विकसित झाला. ह्याचे मुख्य कारण म्हणजे जैन विधी करता त्याची आवश्यकता होती. अशा जैन मंदिरामध्ये 24 किंवा 72 देवकुलिका असतात व त्यात भूत आणि भविष्यकाळातील 24 कीर्तनकारांच्या मूर्ती असतात. यवत येतील या मंदिरात इतक्या देवकुलिका कशासाठी बांधण्यात आल्या याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही.
भुलेश्वर
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. येथील मंदिर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून पूर्वेस सु. ४३ किमी. वर असलेल्या यवत गावाच्या नैर्ऋत्येस सु. पाच किमी. अंतरावर असून ते सस. पासून २१३ मी. उंच अशा एका टेकडीवर बांधलेले आहे.
या टेकडीकडे यवतकडून बैलगाडीच्या रस्त्याने, तसेच दक्षिणेकडील माळशिरस या गावाकडूनही पायवाटेने जाता येते. भुलेश्वर या महादेवाच्या नावामुळे या टेकडीस भुलेश्वर टेकाड म्हणतात. पंचक्रोशीतील ग्रामीण लोकांत यवतेश्वर डोंगर असाही याचा उल्लेख केला जातो.
भुलेश्वराचे मूळ मंदिर एका भव्य प्रकारात चौथऱ्यावर तारकाकृती विधानात बांधले असून प्रकाराला दक्षिण व पूर्वेकडून दोन द्वारे आहेत. मूळ मंदिर पूर्वाभिमुख असून ते नागर वास्तूशैलीतील भूमिज या उपवास्तूशैलीत बांधले आहे. मंदिर वास्तूत नेहमी आढळणारे गर्भगृह, अंतराल, सभामंडप आणि नंदिमंडप (सभामंडपापासून थोडा पुढे) असे चार भाग आहेत. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतर बांधलेले असावे. मंदिराच्या समोरच्या बाजूस दक्षिणेकडे नगारखाना आहे.
प्रकाराच्या आतील बाजूंस ओवरीयुक्त सोपे (अंकणे) असून त्यांच्या पानपट्टीवर (आर्किट्रेव्ह) शिल्पे आहेत आणि अधूनमधून देवकुलिकाही आढळतात. त्यांतूनही मूर्ती बसविल्या आहेत. मंदिरातील काही मूर्ती फोडलेल्या आढळतात. गर्भगृह चौरस असून अंतरालातून तीन पायऱ्या उतरून आत खाली गेले म्हणजे गर्भगृह लागते. त्यात शिवलिंग आहे.
गर्भगृहाच्या भिंतीच्या आतील पृष्ठभागावर नक्षीकाम नाही. अंतराल म्हणजे सभामंडप व गर्भगृह यांत एक अरुंद जोडमार्ग असून द्वारशाखांवर नक्षीकाम आहे. त्यात द्वारपाल, कीर्तिमुख, मकर आदी मूर्ती आढळतात.
उंबरठ्यावर दोन्ही बाजूंस कीर्तिमुखे आहेत. सभामंडपात कक्षासने (अर्ध भिंती) असून त्यांवर बाहेरच्या बाजूने (मागील बाजूस) शिल्पे आहेत. सभामंडपाचे स्तंभ फारसे अलंकृत नाहीत; मात्र त्यांची स्तंभशीर्षे नागशीर्षक किंवा कीचक पद्धतीची आहेत. मंदिराच्या मंडोवरावर तिन्ही बाजूंनी मूर्तिकाम असूनही दक्षिण, उत्तर व पश्चिमेकडील प्रमुख मध्यकोनाड्यांत मूर्ती नाहीत. स्वतंत्र नंदिमंडपातील नंदिची मूळ मूर्ती सुस्थितीत आहे.
मंदिराच्या पीठावर गज, अश्व, नर असा कोणताही सांकेतिक थर नाही; परंतु हंस, लतावेल, मकर, कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात. मूर्तिसंभारात मातृका मूर्तीचे प्रमाण अधिक असून नारसिंहीव्यतिरिक्त ब्राम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे.
त्याखालोखाल नृत्यांगना, मृदुंगवादक, दर्पणधारी इ. सुरसुंदरीच्या मूर्ती असून कक्षासनाच्या मागील बाजूस रामायण-महाभारतांतील घटनांचे कथात्मक शिल्पांकन आहे. याशिवाय प्राण्यांच्या शिल्पांकनात हत्ती, सिंह, माकडे, घोडे यांबरोबरच उंटाच्या प्रतिमा आहेत.
एकूण शिल्पसंभारातील काही प्रतिमा विलक्षण चित्तवेधक असून लक्षणीय आहेत. त्यांना छायाप्रकाशामुळे उठाव आला आहे. बहुतेक मातृका मूर्ती पर्यंकासनात भद्रपीठावर खोदलेल्या आहेत आणि त्यांची आयुधे व काहींची वाहने स्पष्ट दर्शविलेली आहेत. कथानकातील द्रौपदी स्वयंवर, अर्जुनाचा मत्स्यभेद आदी प्रसंग तसेच पश्चिमेकडील भिंतीवर असलेले तीन स्वतंत्र धडांचे परंतु कमर एक असलेले दोन पायांचे एक चमत्कृतिपूर्ण पुरुष-शिल्प सुरेख आहे.
सुरसुंदरींमधील उत्तरेकडील भिंतीवरील दर्पणधारीचे उत्थित शिल्प मनोवेधक असून ते भग्न झाले असले, तरी अवशिष्ट भागावरून त्याचा सुरेख ढंग दृग्गोचर होतो. डाव्या हातात गोल आरसा घेतलेली ही सुरसुंदरी त्रिभंगात उभी आहे.
ती आरशात सौंदर्य पाहून उजव्या हाताने आपले केस व्यवस्थित करीत आहे. तिचे उत्तान पुष्ट स्तन, विशाल नितंब आणि रेखीव हनुवटी, नाक व डोळे तिच्या यौवनात भर घालतात. एकूण मूर्तीला लय असून रेखांकन आकर्षक आहे.
भुलेश्वराच्या मंदिरात मातृकापट्टांत भैरव आणि गणेश यांच्या मूर्ती आढळत नाहीत, मात्र गणेशीची किंवा वैनायकीची मूर्ती दिसते. ही मूर्ती यादवकालीन शिल्पात इतरत्र क्वचित आढळते. त्याचप्रमाणे उंटाचे शिल्पांकन महाराष्ट्रात अकोला (अहमदनगर जिल्हा) येथील तत्कालीन सिध्देश्वराच्या मंदिरातच फक्त दिसते. त्यामुळे वास्तूशिल्पशैलीच्या आधारे या मंदिराचा काळ तज्ञांनी इ. स. तेराव्या शतकाचा प्रारंभ असा ठरविला आहे.
संदर्भ : 1. Deglurkar, G. B. Temple Architecture and Sculpture of Maharashtra, Nagpur, 1974.
2. Naik, A. V. The Bhuleshvar Temple Near Yavat; Bulletin of the Deccan College
Research Institute, Vol. IV No.2, December, 1942, Poona.
३. पारसनीस, द. ब. श्रीमहापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर चरित्र व पत्रव्यवहार, मुंबई, १९००.
४. पुरंदरे, कृ. वा. शिवचरित्रसाहित्य, खंड १, पुणे, १९२६.
देशपांडे, सु. र
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple)
आशुतोष गोडबोले
August 14, 2015
2
184
Share
carasole
पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या संख्येने बांधण्यात आली होती. भुलेश्वरचे मंदिर इ.स. 1230 मध्ये निर्माण करण्यात आले असे मानले जाते. त्या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्वरच्या मंदिरात स्त्रीरुपातील गणेशमूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते.
भुलेश्वरच्या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती आणि पाकळ्यासदृश्य आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत भुलेश्वर मंदिरातील शिल्परचना उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या त्या मंदिराच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. अर्धखुला मंडप, मधला भाग आणि मुख्य गाभारा असा त्या मंदिराचा परिसर आहे. तेथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराच्या गाभा-यात शिवलिंग आहे. मंदिराच्या सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी, मूळ मंदिरास भव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. अठराव्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. भिंतींवर कोरीवकाम, मूर्तीकाम केलेले आहे. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा तेथे जास्त रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथानकशिल्पे, तसेच मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन त्या मंदिरात आढळते. कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या, घंटा ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. तेथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव तेथील काही शिल्पांवर ठळक रीत्या आढळतो. यादव साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही त्या काळात नुकसान झाले.
विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने भुलेश्वराच्या डोंगरावर ‘दौलत मंगल’ नावाचा किल्ला १६३४ मध्ये बांधला (संदर्भ – शिवचरित्र प्रदीप – १९२५). त्या किल्ल्याचा भग्न बुरूज मंदिराकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. त्यासोबत तटबंदी, ताशीव दगडात बांधलेला किल्ल्याचा दरवाजा, पाय-यांचे मार्ग, पायाचे टाके पाहायला मिळतात. पहिले बाजीराव पेशवे व साताऱ्याचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. भुलेश्वरचे मंदिर त्यापैकी एक. स्वामींनी १७३७ मध्ये एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. ते बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवत असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरता सव्वाशे रुपये व सोन्याच्या सव्वाशे पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवत या ठिकाणी विहिरी व तळी बांधून दिली. तेराव्या शतकात बांधलेल्या त्या मंदिराचे प्रवेशद्वार शिवकालिन गोमुखी प्रकारचे असल्यामुळे मंदिराचा जिर्णोद्धार झाला असल्याचे स्पष्ट होते. त्या जीर्णोद्धारामुळे ते मंदिर हेमाडपंथी-मराठा संमिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे तो प्राणी कोणता असावा ते कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यांत उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतिके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिक रीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरांपेक्षा भुलेश्वर येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुख, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगांस कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणाभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगड यामध्ये कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीरूपी दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलासलेण्यात त्या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या पंधरा हजार श्लोक असलेल्या काशिखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा उल्लेख आढळतो. देवीसहस्त्रनामात त्या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपती यांच्याप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. तेथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
भुलेश्वरला पोचण्यासाठी पुणे–सोलापूर महामार्गाद्वारे उरुळी कांचन, लोणी काळभोर मार्गे यवतजवळ यावे. यवतच्या अलिकडे उजवीकडे भुलेश्वर आणि माळशिरस यांच्याकडे जाणारा फाटा आहे. त्या रस्त्याने घाट चढून आठ किलोमीटर गेले, की पठारावर सपाटीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे चढावर दूरध्वनी मनो-याच्या शेजारीच भुलेश्वराचे मंदिर आहे.
मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला तेथे भाविकांची गर्दी होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात मंदिरात भुलेश्वराची पालखी नेली जाते.
पुरातत्त्व खात्याने ते मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
यवतच्या यादवकालीन भुलेश्वर मंदिरातील पौराणिक रोचक आणि आभासी शिल्पांची माहिती देऊ शकता का?
आपली संस्कृती म्हणजे पौराणिक आणि प्राचीन शिल्पकला, वास्तुकला आणि कला कौशल्याचे भांडार आहे. आजच्या विज्ञान युगात आणि पुरोगामी विचारसरणीची मुळ आपल्या मनात एवढी खोलवर रुजली आहे की, आपल्याला आज विज्ञान युगात पण काही गोष्टी अशक्य आहेत, जे प्राचीन काळी अत्यंत कला कौशल्याने साकार केले, त्यावर आपले पुरोगामी विचार अभ्यास आणि निष्कर्ष काढण्यासाठी कमी पडतात. कालाच्या ओघात या शिल्पकला दुर्लक्षित झाल्याने त्यांची पडझड झाली असली तरी त्यांचे महत्व मात्र कमी होऊ शकत नाही. आज त्यांच्यामुळे पौराणिक वारसा, आणि सांस्कृतिक अभिमान जोपासला जात आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील यादवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले सर्वज्ञात असेच एक स्थळ, म्हणजे भुलेश्वर मंदिर होय. सर्वज्ञात म्हंटल तरी आपला पौराणिक अभ्यास हा फक्त कामचलाऊ असल्याने येथील कलाकुसरी आणि शिल्पपटाबद्दल आपल्याला जुजबी माहिती तरी असेल, असे पण गृहीत धरता येत नाही.
हे भुलेश्वर मंदिर पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून पूर्वेस सु. ४३ किमी. वर असलेल्या यवत गावाच्या नैर्ऋत्येस सु. पाच किमी. अंतरावर असून ते समुद्र सपाटी पासून २१३ मी. उंच अशा एका टेकडीवर बांधलेले आहे.
या टेकडीकडे यवतकडून बैलगाडीच्या रस्त्याने, तसेच दक्षिणेकडील माळशिरस या गावाकडूनही पायवाटेने जाता येते. भुलेश्वर या महादेवाच्या नावामुळे या टेकडीस भुलेश्वर टेकाड म्हणतात. पंचक्रोशीतील ग्रामीण लोकांत यवतेश्वर डोंगर असाही याचा उल्लेख केला जातो.
भुलेश्वराचे मूळ मंदिर एका भव्य प्रकारात चौथऱ्यावर तारकाकृती विधानात बांधले असून प्रकाराला दक्षिण व पूर्वेकडून दोन द्वारे आहेत. मूळ मंदिर पूर्वाभिमुख असून ते नागर वास्तूशैलीतील भूमिज या उपवास्तूशैलीत बांधले आहे. मंदिर वास्तूत नेहमी आढळणारे गर्भगृह, अंतराल, सभामंडप आणि नंदिमंडप (सभामंडपापासून थोडा पुढे) असे चार भाग आहेत. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतर बांधलेले असावे. मंदिराच्या समोरच्या बाजूस दक्षिणेकडे नगारखाना आहे.
चित्रस्त्रोत : गुगल
भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे काही शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना. या पैकी डाव्या बाजूला रामायण तर उजवे बाजूस महाभारत शिल्पपट आहेत. पैकी महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण आहेत मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. पैकी त्या उरलेल्या दोन पटांचे काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधण्यास खूपच जिकिरीचे आहे.
सर्वात प्रथम रामायणातील काही शिल्पपटांची माहिती करून घेऊ या ;
१. राम लक्ष्मण सीता :-
इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले.
चित्रस्त्रोत : गुगल
रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर. पायर्यांनजीकच्या उजवे बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमा सुद्धा बसवलेल्या आहेत.
दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल यत्किंचितही शंका नाही, मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा.
२. रामायण अखंड शिल्पपट:-
दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो.
चित्रस्त्रोत : गुगल
मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. तसेच हा प्रसंग सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध तदनंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा, अशी शक्यता आहे.
३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) )
चित्रस्त्रोत : गुगल
मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात.
यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.
४. रामायण शिल्पपट
चित्रस्त्रोत : गुगल
यातील एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे.
५. मारिचवध
उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे.
चित्रस्त्रोत : गुगल
मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.
६. अगम्य शिल्पपट
चित्रस्त्रोत : गुगल
ह्या पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत. एक अंदाज म्हणाल तर ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल.
महाभारतातील काही शिल्पपट :-
महाभारतातील शिल्पपट रामायणातील शिल्पपटाच्या तुलनेत संपूर्ण आणि सलगपणे बर्यापैकी अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व ह्या पर्वांमधील आहेत.
रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.
१. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट:-
चित्रस्त्रोत : गुगल
यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे.
द्रुपदाच्या डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की येथील शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते.
कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.
२. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू)
चित्रस्त्रोत : गुगल
या मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
३. अर्जुन -भीष्म युद्ध :-
चित्रस्त्रोत : गुगल
कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री असलेल्या शिखंडीशी मी युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात.
ह्या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.
४. भीष्म शरशय्या:-
चित्रस्त्रोत : गुगल
भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
५. अर्जुन- कौरववीर युद्ध:-
चित्रस्त्रोत : गुगल
कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही.
६. भीम-गजयुद्ध
चित्रस्त्रोत : गुगल
द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच.
एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
७. शल्ययुद्ध
चित्रस्त्रोत : गुगल
शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय.
हे शिल्पपट पौराणिक आणि रामायण , महाभारत यांची अनमोल माहिती देतात. असे हे दुर्मिळ शिल्पपट रामायण आणि महाभारताचा सखोल अभ्यास असेल तर अत्यंत बारकाईने निरीक्षण केल्यानंतर काही अंशी तर ओळखता येतात.
बरेच दिवस समाधी अवस्थेत असलेल्या ब्लॉगला आज काही प्रमाणात संजीवनी मिळेल असे वाटत आहे. मनात साचलेले खूप आहे पण खरडायला काही वेळ मिळत नाही. नवीन नोकरी आणि कांदे-पोहे कार्यक्रम या दोन्ही गोष्टी अश्या काही मानगुटीवर बसल्यात की गुडघे पार दुखून जातात. ( यातले कोणाला किती कळले माहित नाही,मला काहीच कळले नाही असो. )
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
तर आमचा प्लान होता पुणे-> यवत-> भुलेश्वर->माळशिरस-> पांडेश्वर-> सासवड->पुणे. आणी ते पण बाईक वर. "माझ्या बाईकची दोन्ही चाके फिरतात आणी ब्रेक लावला की थांबतात." असा एका वाक्यात तिच्यावर निबंध होऊ शकेल. असो.
यवत पासून उजवीकडे एक फाटा फुटतो. रस्त्यावरच भुलेश्वर मंदीर अशी पाटी लावलेली दिसते. पुण्यापासून यवत ५५ किमी आणि तेथून बोपदेव घाटातून भुलेश्वर १५ किमी.बोपदेव घाट संपला की लगेच एक फाटा फुटतो तेथून उजवीकडे भुलेश्वर मंदीर.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा ढग भरून आलेच होते. मस्त हिरवागार,निर्जन परिसर, हलकासा पाऊस. मजा आली. हलकाश्या पाऊसात निवांत गाडी चालवत गप्पा टप्पा करत चाललो होतो. एखाद दुसरी दुधाची गाडी ये जा करत होती.
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.
येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.
प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प.
या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.
ऐरावातावळ
प्रत्येक शिवमंदिरात प्रवेशद्वाराशी कासव का असते याचा अभ्यास करायला हवा. मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पण सोमेश्वर मंदिरात असेच कासव होते.
मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
महानंदी
मुख्य मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते महानंदीचे. मंदिराच्या मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. प्रत्येक अन प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक डिटेल काम पाहून डोके चक्रावून जाते.
महाभारतातील अर्जुन-कर्ण युद्धाचा प्रसंग.
युद्ध दर्शवताना हवेत मारलेले बाणही स्पष्ट दिसतात.
भुलेश्वर मंदिर, माळशिरस- पुणे.
भुलेश्वर हे प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिद्वितीय आहे. काळात बर्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे.
भुलेश्वर मंदिर
महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
परंतु पत्रकार कवी यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.
मंदिराची रचना
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर आहे.
गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर आणि तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.
मंदिराची शैली
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे.
पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिराचा गाभारा
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपर्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभार्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणार्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवर्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिरातील शिल्पे
या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. (युध्द आणि परकीय आक्रमण) इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
कसे जाल
अंदाजे ५० कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. पुण्यातील बसस्थानकावरून निघून यवत बसस्थानकापर्यंत बस जाते. तेथून पुढे सहा आसनी रिक्षेने भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येते. तसेच यवत सासवड ही बस ही यवत वरुन भुलेश्वर मार्गे सासवड ला जाते .
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच द्वारपाल जय-विजय, पायऱ्यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते. शिखरावरील चुन्याच्या बांधकामावर गणेश, विष्णू आदी देवतांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो.
या मंदिरात प्रवेश करताक्षणीच लाजवाब, भारी, खूपच सुंदर..असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते. मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभुषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल. नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची सुरेख िपडी आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट कोरलेला दिसून येतो. या शिल्पकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे पाहू आणि किती पाहू यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं स्त्रीरूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते तर समाधान, विरंगुळा, ऊर्जा, मनाला छेडणारी तार..हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या सौंदर्यतेच्या मापदंडांचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसूकच या सौंदर्यतुषारात भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात भुलवून सोडणारं हे भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा.
किल्ल्याची ऊंची : 2000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन शहाजीराजांच्या काळात दौलतमंगळ किल्लाची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरुन या किल्ल्याला “दौलतमंगळ गड” हे नाव पडले असावे.
पुण्याहुन स्वत:च्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलतमंगळ गड उर्फ भुलेश्वर ही दोनही ठिकाणे पाहता येतात.
पहाण्याची ठिकाणे :
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून १० किलोमीटर अंतरावर दौलतमंगळ गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते. वाहनाने गेल्यास वाहने मंदिराच्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तिथून मंदिरात प्रवेश होतो यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो. डावीकडील पायर्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य साधरणपणे ६ फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरी नक्षी काम, विविध शिल्प, कोरीव मुर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतींवर कोरलेल्या मुर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेवून मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेवून त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे. त्याबाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी वास्तू ( कोठार) आहे. समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे. त्याच दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास एक तास लागतो. मंदिरा जवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:च्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गा वरून ( पुणे – हडपसर- उरळी कांचन ) साधारणपणे ४५ किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलिस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजुच्या पाटाच्या रस्त्याने दौलतमंगळ गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात घाटमार्गाने पोहोचता येते. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर १० किलोमीटर अंतरावर आहे.
राहाण्याची सोय: गडाचा,मंदिराचा परिसर मोठा असून राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय: गडावर जेवण्याची सोय नाही. दर रविवारी भुलेश्वर मंदिरात प्रसाद असतो.
पाण्याची सोय: पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: यवत गावातून चालत जाण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो.
साभार: ट्रेक क्षितीज संस्था
मंदिराच्या काही अंतरावर एक ढासळलेल्या बुरुजावरून घेतलेले मंदिराचे हे सुरेख छायाचित्र!
मंदिराच्या प्रांगणाच्या आरंभाला स्वागत करतात ते द्वारपाल..
आणि ह्स्तीशिल्प...........
मंदिराच्या प्रांगणात एकीकडे आहे चतुष्की. हीचा उपयोग यज्ञ किंवा दीक्षा देण्यासाठी होत असावा.
तर मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आहे ही भलीमोठी घंटा...
हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार...अतिशय साधे ...वाकून जावे इतके छोटे....
मंदिराच्या छतावर आहे हे सुंदर नक्षीकाम...
दरवाज्याकडे तोंड करून आहे हे कासवाची प्रतिमा...कासवासारख्या धीम्या शारीरिक आणि मानसिक गतीने मंदिरात प्रवेश करावा असेच जणू सांगण्यासाठी .
दरवाजाच्या पायरीजवळ आहे चतु:शीला...त्यावर दोन्ही बाजूला कोरले आहेत दोन कीर्तिमुख...
किंचित झुकत दरवाज्यातून आत गेल्यावर लागते दोन्ही बाजूला सुरेख नक्षी असलेले किंचित बसके अजून एक द्वार......ह्या द्वारावर पाच पट्ट्या कोरलेल्या आहेत...
डावीकडून त्यांची नावे आहेत, व्यालशाखा, पत्रशाखा, स्तंभशाखा, नर अथवा मानवशाखा आणि पुन्हा पत्रशाखा...
आणि द्वारावर आहे ललाटबिंब...
दरवाज्यातून समोरच दर्शन देते ती हनुमान प्रतिमा...
उजवीकडून काही दगडी पायऱ्या चढून गेल्यावर दिसते ते चकित करणारे मंदिराच्या सभामंडपातील शिल्पवैभव! हो वैभवच ते...नक्षीदार असंख्य स्तंभांनी आणि शिल्पांनी नटलेले आणि मढलेले सभामंडप........
हे शिल्पवैभव मोहून टाकणे, मतीगुंग करणारे ....ह्या मोहजलातून बाहेर आले हे भुलेश्वर अर्थात शिवाचे दर्शन घेण्यासाठी.....
दर्शन घेऊन निघताना नजर खिळवून राहिली ती सभामंडपातील अत्यंत सुरेख, सुबक, आकर्षक, अवाढव्य नंदिशिल्पाकडे!
सूर्यकिरणांचा अभिषेक थेट शिवपिंडीवर व्हावा म्हणून नंदीने आपले मुख किंचित वळवले ! कथा हे सांगते. पण त्यामागचा भावार्थ आपण घेऊ तसा..शिवपिंड आणि रविकिरण यांच्या मधे येणारा मी कोण? किती ही उदात्त भावना....
.
सभामंडपात एका विलक्षण प्रतिमेने लक्ष वेधून घेतले....भव्य कासव प्रतिमा...
हे कासव इथे कसे आले? की आधीच इथे होते? ह्या पेक्षाही मला भावले तो त्याची मन लुभावणारी प्रतिमा....अतिभव्य, सुरेख, सुबक आणि सुरचित.....कासवासारखे नतमस्तक, शरणागत होत, अध्यात्मिक उन्नती हा एकच भावार्थ मनी ठेवत शिवाचे दर्शन घ्यावे असेच तर नाही ना संदेश देत हे कासव?
आता सुरु झाला नजरभेट ते ज्ञानभेट हा प्रवास.....एक एक शिल्प बारकाईने पाहून त्यामागची त्याची कथा भावार्थ समजून-उमजून घेण्याचा प्रवास...
रामायणातील श्रीराम-भरत मिलाप दृश्य साकारणारे हे सुरेख शिल्प...
श्रीराम वानरसेना घेऊन परतत आहेत (डावीकडून..)
हत्ती घेऊन भेटीला येत आहे अत्यंत प्रिय बंधू भरत...
रामायणातील सुप्रसिद्ध मारिचवधाचा प्रसंग सभामंडपात कोरला आहे..
महाभारतातील युध्दासहित काही प्रसंग इथे कोरलेले आहेत. त्यापैकी एक द्रौपदीस्वयंवराचा शिल्पपट असाच मनमोहक..
रथावर आरूढ कृष्ण आणि अर्जुन..
पितामह भीष्म मृत्यूशय्येवर असताना त्यांना भेट देणारे पांडव....
द्रूष्टदुन्म्य आणि पांडव कथा
घटोत्कच युद्ध..
सभामंडपात एका ठिकाणी उंचावर समुद्रमंथन प्रसंग शिल्पपट आहे..समुद्रमंथन एक सुप्रसिद्ध पौराणिक कथा आहे. देव आणि दानवांनी मिळून हे समुद्रमंथन केले होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्राचे वैभव समुद्रात मिळाले. समुद्रात पडलेले वैभव परत मिळवण्यासाठी विष्णूने इंद्राला समुद्रमंथनाचा उपाय सुचवला. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी करून आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन करावे. त्यातून अमृतप्राप्ती होईल . वैभव पुन्हा प्राप्त होईल. अशी ही थोडक्यात कथा असणारे हे शिल्प!
सभामंडपात अगणित देवकोष्ठ आहेत. मुख्य मंदिराच्या बाह्य भागावर सूरसुंदरीची विविध शिल्प कोरलेली आहेत. मूर्तीभंजकांनी ह्या शिल्पांची तोडफोड केली असली तरी शिल्पकारांनी किती कल्पकतेने शिल्पांमध्ये सौंदर्य भरले आहे ह्याची कल्पना शिल्प पाहताना येते.
हातात मृदुंग घेतलेली ही सुंदरी. हीच नाव आहे मर्दला!
प्रेतावर उभी चामुंडा..सप्तमातृका पैकी एका शैवशक्ती चे एक संहारक, रौद्र रूप. पौराणिक कथे नुसार काली अवतारात असताना या शक्ती देवतेने चंड आणि मुंड या दोन शक्तीशाली असुरी वृत्तीच्या राक्षसांना ठार मारले. त्यामुळे हिला चामुंडा हे नाव मिळाले. या देवतेचे वाहन प्रेत असते. पुण्याजवळील भुलेश्वर मंदिरात प्रेतावर उभ्या देवी चामुंडाचे शिल्प आहे. मुर्तिभांजकांनी हात - पाय तोडले असले तरी देवी चामुंडा चे हे अद्भुत शिल्प शिल्पकारांनी इथे कोरले आहे.
महिषासूरमर्दिनी..
मर्कट आणि सुंदरी..
नाग धारण केलेली वनिता..
दर्पणसुंदरी..सौंदर्य आरशात न्याहाळण्या सोबतच शिल्पाचा भावार्थ आहे, मंदिरात जाण्याआधी स्व-अवलोकन, आत्म-मंथन, आत्म-विश्लेषण करा. आपल्या भावना, विचार यांचा मागोवा घेत पवित्र मन सौंदर्याने मंदिरात प्रवेश करा.
सप्तमातृकामधील ऐरावतावर आरूढ इंद्राणी..
सप्तमातृकामधील..डावीकडील विनायकी, बैलावर/वृषभावर आरूढ माहेश्वरी आणि मोरावर आरूढ कौमारी....
सप्तमातृका ह्या देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृका ह्या पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे त्या मूर्ती स्त्री रुपात घडवल्या गेल्या. ब्रम्हाची ब्राम्ही/ब्रम्हाणी, इंद्राची इंद्राणी.एन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा ह्या त्या सप्तमातृका! हातात आयुधे आणि हस्तमुद्रा या रुपात त्या आढळतात.
योगिनी, वैनायकी यांचे संदर्भ पुराणात आढळतात.
वैनायकी ही विनायकाची स्त्री रुपी प्रतिमा..
वैनायकी ला गणेशानी, लंबोदरी, विघ्नेश्वरी, स्त्री-गणेश असे देखील म्हणतात. गजवदना वैनायकीच्या आसनासमोर मूषक आहे. हातात दंड, अंकुश आणि मोदकपात्र आहे. डावीकडे वळलेली सोंड असून तोंडात हस्तीदंत आहेत. गळ्यात हार, हातात कंकणे आणि पायात नुपूर आहेत.
खालील शिल्पपटात गरुडावर आरूढ वैष्णवी (उजवीकडील) दिसत आहे...
ह्या असंख्य शिल्पाप्रमाणेच उलटे नाग असलेली यादवकालीन बांधकाम रचना येथे आहे.
खांबावर उलटे नाग आणि हत्ती आहे..
गरुडधारी संभाव्य भुयारी मंडपातील आतील भींतीवर शेषशायी विष्णूशिल्प आहे.
मंदिराच्या पूर्णपणे बाहेरील भिंतीवर दोन कां शिल्प आहेत..
मंदिराच्या बाहेर चक्कर मारली तर ढवळगड, पुरंदर, मल्हारगड किल्ले इथून दिसतात.
मंदिर बाहेरून बघितले तर आतल्या शिल्पवैभवाची सुतराम कल्पना येणार नाही असे हे भुलेश्वर मंदिर! मंदिराची सफर करताना नजरभेट चे रुपांतर ज्ञानभेटीत तर झालेच परंतु सतत शिल्पवैभवा पाठील हात स्मरणात येत राहिले. एक हात ज्यांनी शिल्पांची तोडफोड केली आणि एक हात ज्यांनी ह शिल्पे घडवली!
सलाम त्या शिल्पकारांना ज्यांच्या सिद्धहस्त चमत्कारातून ही भुरळ पडणारी शिल्पवैभव निर्मिती झाली!
वैनायकी – शक्ती, योगिनी आणि मातृका -
गणपतीचे संपूर्ण भारतात अस्तित्व बघायला मिळत असले तरी गणपतीचे पूजन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते. विघ्नांचा नाश करणारा, भक्तांचे रक्षण करणारा, मंगलमय वातावरणाची निर्मिती करणारा देव म्हणून गणपतीकडे बघितले जाते. विघ्नकर्ता असणारा गणपती पूजा केल्यास विघ्नहर्ता होतो. गणपतीच्या मूर्तीकडे बघताना सुटलेले पोट, हत्तीची सोंड, मोदक, भव्य गंडस्थल, आखूड मांड्या या गोष्टींकडे लक्ष वेधले जाते. हिंदू दैवतांमध्ये ह्याचे आगमन उशिरा झाले असले तरी फार कमी कालावधीत हिंदू धर्मातील मुख्य देवता होण्याचा मान गणपतीने मिळवला आहे. प्रत्येक शुभकार्य हे गणपतीच्या पूजेशिवाय अशक्य आहे. शैव, वैष्णव, शाक्त पंथाप्रमाणे गणपतीला पुजणारा गाणपत्य पंथ उदयाला आला. फक्त गणपती करिता “गणेशपुराण” आणि “मुद्गलपुराण” अशा दोन उपपुराणांची निर्मिती झाली. हिंदू धर्माबरोबर गणपतीचे अस्तित्व बौद्ध आणि जैन धर्मातसुद्धा दिसून येते. अनेक आशियाई देशांमध्ये गणेश देवतेचा प्रसार झाला आहे. दक्षिणेकडील राज्यात गणपती ब्रम्हचारी असतो, तर महाराष्ट्रात रिद्धीसिद्धी त्याच्या दोन पत्नी आहेत.
हिंदू धर्मात शक्ती संकल्पनेचा उदय झाल्यानंतर प्रत्येक देवतेची शक्ती म्हणून देवतांना स्त्रीरुपात दाखवण्यास सुरुवात झाली. उदा. ब्रह्मा-ब्रह्माणी, विष्णु-वैष्णवी, महेश्वर-माहेश्वरी इ. मध्यकाळात मुख्य देवता म्हणून विनायकाची पूजा सुरु झाली आणि लवकरच विनायकाची शक्ती म्हणून वैनायकीची सर्वत्र पूजा होऊ लागली. एच. डी. भट्टाचार्य यांच्या मते मुख्य देवता म्हणून गणेशाचे पूजन होऊ लागले, त्याचवेळी गणेशाची शक्ती म्हणू गणेशानी हिचे पूजन होण्यास सुरुवात झाली असावी. विनायकी, विघ्नेश्वरी, गणेशानी, गणेस्वरी, गजानना, गणपतीहृदया इ. वैनायकीची काही नावे आहेत.
सहाव्या शतकातील वराहमिहिरलिखित “बृहदसंहिता” ग्रंथात मातृकांच्या मूर्तीविषयी खालील श्लोक आहे.
मातृगण: कर्तव्य: स्वनामदेवानुरूपकृतचिन्ह:|
रेवन्तोश्वारूढो मृगयाक्रीडादिपरिवार॥
(बृहतसंहिता, अध्याय ५७, श्लोक ५६)
श्लोकानुसार मातृका ज्या देवाच्या आहेत, त्या देवाचे रूप ध्यानात ठेवून बनवल्या पाहिजेत. यात कुठेही मातृकांच्या नावाचा उल्लेख नाही आहे. श्लोकातील पहिला ओळ मातृकांविषयी, तर दुसरी ओळ सूर्यपुत्र रेवंतविषयी आहे. उत्पल (९वे-१०वे शतक) यांनी बृहदसंहितेवर टीकात्मक ग्रंथ लिहिला. उत्पल यांनी बृहतसंहितेतील मातृकांच्या श्लोकावर टिका करताना मातृकांना ब्राह्मी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ऐन्द्री, यामी, वारुणी, कौबेरी ही नावे दिलेली आहेत. त्याचबरोबर नारसिंही, वाराही आणि वैनायकी या इतर मातृका आहेत असे सांगितले आहे.
सोळाव्या शतकात केरळ येथील श्रीकुमार यांनी देवतांच्या मूर्तीविषयी “शिल्परत्न” हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात शक्ती-गणपतीचे वर्णन करणारा पुढील श्लोक आहे.
सारांश: त्याचा कंठाखालचा भाग युवतीसारखा आणि कंठावरचा भाग हत्तीसारखा आहे. शेंदुरासारखा लाल वर्ण आणि स्तनामुळे झुकलेला तुंदिलतनू असा तो शक्तीगणपती आहे.
पुराणातील वैनायकीचे संदर्भ
स्कंदपुराणाच्या काशीखंडात (४५वे प्रकरण) व्यासऋषी यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना स्कंदऋषी चौसष्ट योगिनींची नावे सांगतात आणि त्यातील पहिले नाव गजानना आहे. मत्स्यपुराणामध्ये २०० स्त्रीदेवतांचा उल्लेख आहे आणि वैनायकी त्यापैकी एक नाव आहे. परंतु अग्नीपुराणात उल्लेखलेल्या योगिनींच्या नावामध्ये गजानना किंवा वैनायकी नावाचा उल्लेख नाही आहे. देवी-सहस्त्रनाम ग्रंथात देवीच्या एक हजार नावांचा उल्लेख केला आहे. त्यात विनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी ह्या तीन नावांचा उल्लेख आला आहे. विष्णुधर्मोत्तरपुराण आणि मत्स्यपुराणातील कथेनुसार भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध करताना, त्याचे रक्त जमिनीवर पडल्यानंतर नवीन अंधकासुराची निर्मिती होऊ नये म्हणून युद्धात त्याच्या पडलेल्या प्रत्येक रक्ताचा थेंब भक्षण करण्यासाठी मातृकांची निर्मिती केली. त्यापैकी एक मातृका म्हणजे वैनायकी. लिंगपुराणात विनायकीचा उल्लेख आलेला आहे.
जैन आणि बौद्ध धर्मातील वैनायकीचे स्वरूप
जैन धर्मात वैनायकीची योगिनी म्हणून उपासना केली जात होती. बडोदा येथील जैन मंदिररातील हंस विजय संग्रहात “चतुष्षष्टियोगिनी” (हस्तलिखित क्र. ३९६) हस्तलिखितात महायोगी, सिध्दीयोगी, प्रेताक्षी, डाकिनी आणि इतर योगिनींच्या नावाबरोबर गणेश्वरी हे नाव आलेले आहे.
बौध्दधर्माच्या वज्रयान पंथात वैनायकीला गणपतीहृदया नावाने ओळखले जाते. अमृतानंदलिखित “धर्मकोशसंग्रह” ग्रंथात गणपतीहृदया या देवीचे वर्णन नृत्यस्थिती, एकमुख, द्विभुज, एक हात वरदमुद्रेत आणि दुसरा हात अभयमुद्रेत असे करण्यात आले आहे. जैन आणि बौद्ध धर्मानी वैनायकीला आपल्या देवतांमध्ये समाविष्ट केले याच्यावरून तिचे महत्त्व दिसून येते.
सप्तमातृका आणि गणेश
वैनायकी आणि इतर मातृकांची निर्मिती शंकराने केली, म्हणून मातृकांना गणेशाची माता असे मानले जाते आणि म्हणूनच सप्तमातृकापटांमध्ये गणपती दिसून येतो. महाराष्ट्रातील अनेक हिंदू लेण्यांमध्ये आणि मंदिरांमध्ये सप्तमातृकापट दिसून येतात. परंतु, पाटेश्वर लेण्यातील मातृकापटात गणपतीला स्थान देण्यात आलेले नाही. “सुप्रभेद आगम” ग्रंथात सप्तमातृकांबरोबर गणेश दाखवावा असे लिहून ठेवले आहे. सुप्रभेदागमनुसार सप्तमातृका/अष्टमातृका शिल्पपटात पूर्वेला वीरभद्र आणि पश्चिमेला गणपतीची मूर्ती असते. मातृकापटात उजव्या बाजूला पहिला गणपती आणि वीरभद्र (भैरव) डाव्या बाजूला सर्वात शेवटी असला पाहिजे असे भुवनदेव लिखित अपराजित पृच्छा या ग्रंथात नमूद केले आहे.
चतुर्भुजास्तु सर्वाश्च नलिनास्ताश्च संस्थिता: |
वीरभद्रन्तु पूर्वे तु विघ्नेशं पश्चिमं दिशि ॥
(सुप्रभेद आगम – मातृस्थानविधिपटल, ४२-६)
मातृणां च ततो वक्ष्ये भैरवादिगणांस्तथा |
वीरेशं कारयेव्दत्स वीणाहस्तं सनर्त्तनम् ॥
गणनाथं तत: कुर्यात् गजवक्त्रं महोत्कटम्
आदौ तु गणनाथं च ह्यन्ते कुर्यात्तु भैरवम् ॥
(अपराजित पृच्छा – २२३, १२-१३)
सप्तमातृका, वेरूळ लेणी
वैनायकीची लघुचित्रे
काही मोजक्या लघुचित्रांमधून (Miniature Paintings) पण आपल्याला वैनायकीचे दर्शन होते. नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय संग्रहालयात १८व्या शतकातील चंबा शैलीतील लघुचित्र आहे. ह्या चित्रात नटेश (शंकर) तांडव नृत्य करत असून त्याच्या शेजारी विनायक, कार्तिकेय आणि गण दाखवले आहेत. ह्या चित्रात विनायक वीणा वाजवत असून नटेशाच्या डाव्या बाजूला गजमुख, चोळीधारण केलेली, मृदुंग वाजवणारी आणि कमरेला व्याघ्रचर्म गुंडाळलेली वैनायकी चित्रित केलेली आहे. एशियाटीक सोसायटी, कोलकाता येथे “गणपतीहृदया” देवतेचे अत्यंत सुंदर लघुचित्र आहे. हे लघुचित्र वज्रयान पंथाच्या धारणी-संग्रह ह्या ग्रंथात आहे. चित्रातील देवता पांढऱ्या रंगात रंगवलेली असून पायाजवळ निळ्या रंगात उंदीर आहे. ह्या चित्राजवळ नेवारी संवत ९६३ (सन १८४३) आणि सर्वात शेवटी “आर्य्यश्रीगणपतिहृदयनामधारणी समाप्त” लिहिले आहे.
वैनायकीची मूर्तीवैशिष्ट्ये
गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, ओडिसा, आसाम आणि तामिळनाडू येथे वैनायकीची काही शिल्प उत्खननात, तर काही शिल्प मंदिरात बघावयास मिळतात. उपलब्ध शिल्पांनुसार वैनायकी आसनस्थ, वाहनावर आरूढ, उभी किंवा क्वचित नृत्यावस्थेत असते. वैनायकी शिल्प दोन किंवा चार हातांची आहेत. तसेच हातामध्ये परशु, पास, कमळ, दंड, सर्प, दात, मोदकपात्र, जपमाळ इ. विविध आयुधे किंवा वस्तू धारण केलेल्या आहेत. तसेच त्या अभयमुद्रा (संरक्षण) आणि वरदमुद्रेत (आशीर्वाद) असतात.
इतर राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण वैनायकी शिल्प
मथुरा येथील शासकीय संग्रहालयात असलेली वैनायकीची मूर्ती भारतातील सगळ्यात जुनी मूर्ती असावी. ह्या मूर्तीचा काळ गुप्त राजवंशाच्या सुरुवातीचा आहे असे मानले जाते. ही मूर्ती द्विभुज असून डाव्या हातात कमळाचे फुल धरले आहे. लोहरी (उत्तरप्रदेश) येथील योगिनी संकुलातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. प्रतिहार काळातील (९वे शतक) ही मूर्ती असून ह्या मूर्तीच्या डाव्या हातात इंद्रासारखे वज्र आहे. तर उजव्या हातात लाडूऐवजी एखादे फळ धरले आहे. ह्या वैनायकीचे वाहनसुध्दा हत्ती आहे. त्यामुळे हि मूर्ती वैनायकीची असली तरी त्यात इंद्राणी (इंद्राची शक्ती) हिचे गुणधर्म दाखवले आहेत. रीखीआन (उत्तरप्रदेश) येथील वैनायकीला चार हात असून डोक्यावर मुकुट आहे आणि गळ्यात हार घातलेला आहे. ह्या मूर्तीला नेसवलेली साडी कंबरेभोवती खोचण्यात आलेली आहे. मध्यप्रदेशातील सुहानिआ येथे सापडलेली मूर्ती ग्वाल्हेर येथील पुरातत्व संग्रहालयात ठेवलेली आहे. वैनायकी त्रिभंग मुद्रेमध्ये असून आपले संपूर्ण वजन डाव्या पायावर घेतले आहे. ह्या मूर्तीच्या हातात कमळपुष्प, तलवार, परशू आणि लाडूंचा वाडगा हातात धरला आहे. ह्या मूर्तीच्या उजव्या पायाजवळ बासरीवादक आणि डाव्या पायाजवळ मृदुंगवादक आहे. सतना (मध्य प्रदेश) येथे उत्खननात सापडलेली आणि सध्या कोलकाता येथील भारतीय संग्रहालयात असलेली दहाव्या शतकातील वैनायकीची मूर्ती थोडी वेगळी आहे. सिंहारूढ वृषभा मातृकेच्या मांडीवर बालगणेश बसलेला आहे. सिंहाच्या पायाजवळ आसनस्थ चतुर्भुज वैनायकी आहे. हिच्या हातात कमळाचे फुल आणि दुसऱ्या हातात पुष्प आहे. उजव्या हातात गदेसारखे शस्त्र आणि डावा हात नष्ट झाला आहे. बहुदा या हात मोदकपात्र असावे. वृषभा मातृकेच्या खालील भागात श्री वसभा (श्री वृषभा) असे कोरलेले आहे.. चिदंबरम, तामिळनाडू येथे नटराजाचे मंदिर आहे. या मंदिरात असलेली वैनायकीची मूर्ती सोळाव्या शतकात विजयनगर राज्यकाळात तयार केली आहे. या मूर्तीचा कमरेच्या वरील भाग वैनायकीचा असून कमरेखालील भाग व्याल या काल्पनिक प्राण्याचा आहे. या वैनायकीची आजही तेथील स्थानिकांकडून पूजा केली जाते. व्याल आणि वैनायकी यांचे संयुक्त असे हे एकमेव शिल्पांकन आहे. याशिवाय चौसष्ट योगिनी मंदिरांमध्ये वैनायकीचे शिल्प बघायला मिळते.
महाराष्ट्रातील वैनायकी शिल्प
महाराष्ट्रात वैनायकीची शिल्प यादवकालीन भुलेश्वर मंदिर (पुणे), पाटेश्वर मंदिर (सातारा) आणि योगेश्वरी मंदिर (आंबेजोगाई) येथे बघायला मिळतात.
पाटेश्वर मंदिरात असलेली वैनायकी
साताऱ्यापासून साधारणपणे ११ किमीवर देगाव येथे पाटेश्वर हा हिंदू लेणीसमूह आहे. येथील पाटेश्वर मंदिरात वैनायकी मूर्ती आहे. मूर्ती रेखीव, चतुर्भुज आणि शिलाखंडावर सुखासनात बसलेली आहे. मूर्तीच्या हातात परशु, पाश(?), सुळा आणि लाडूपात्र आहे. सोंडेचे टोक वळसा घालून लाडूंना टेकलेले आहे. मूर्तीच्या अंगावर वक्षभूषण, कंठभूषण, कमरपट्टा, कंकणे आणि वळे हे अलंकार असून त्यांच्यावर विशेष अशी कलाकुसूर नाही आहे. मस्तकावर असलेल्या किरीटमुकुटाभोवती प्रभावळ आहे. डाव्या पायाची आडवी मांडी घातलेली असून आहे आणि उजवा पायाचा गुडघा किंचित वर उचललेला असून पाय खाली टेकलेला आहे. पायाजवळ मूषक वाहन कोरलेले आहे.
वैनायकी, पाटेश्वर मंदिर
भुलेश्वर मंदिरातील वैनायकी
पुणे – सोलापूर महामार्गावर यवतच्या आधी साधारणपणे १-२ किमीवर भुलेश्वरफाटा आहे. हा रस्ता थेट भुलेश्वर मंदिराजवळ जातो. दूरसंचार विभागाचा मनोरा हि भुलेश्वरची ओळख. हा संपूर्ण परिसर दौलतमंगळ किल्ला किंवा भुलेश्वर मंदिर या नावाने ओळखला जातो. मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर थोड्या उंचीवर दोन वैनायकी मूर्ती आहेत. परंतु येथील वैनायकी इतर मातृकांबरोबर आहेत. हे दोन्ही मातृकापट आहेत. पहिल्या मातृकापटात वैनायकी, माहेश्वरी आणि ब्राम्ही या तीन मातृका आहेत. या शिल्पपटात वैनायकी माहेश्वरीच्या उजव्या हाताला तर ब्राम्ही डाव्या हाताला आहे. दुसऱ्या शिल्पपटात वैनायकी, वैष्णवी आणि कौमारी या मातृकांबरोबर आहे. दोन्ही वैनायकी सालंकृत (पायात वळे, हातात कंकणे, गळ्यात वक्षभूषण व कंठभूषण दागिने) आणि पद्मासनात बसलेल्या आहेत. एका वैनायकीने हातात अंकुश, पाश(?), दात आणि लाडूपात्र धारण केले. दुसऱ्या वैनायकी शिल्पाचा डावा हात नष्ट झालेला आहे. पण ह्या हातात लाडूपात्र असावे आणि इतर आयुधे आधीच्या वैनायकीप्रमाणे धारण केली आहेत.
योगेश्वरी मंदिराच्या शिखरावरील वैनायकी
आंबेजोगाई येथील योगेश्वरी मंदिराच्या शिखरावरील कोनाड्यात वैनायकीची मूर्ती आहे. वैनायकीला सोळा हात असून मोदक, जपमाळ, तलवार, गदा आणि इतर आयुधे धारण केली आहेत. वैनायकीचा उजवा हात अभयमुद्रेत आहे. सोंडेचे टोक डाव्या हातातील लाडूला स्पर्श करते आहे. मोरपिशी रंगाची साडी नेसलेली वैनायकी पद्मासनात बसलेली आहे. प्रत्येक हातात कंकण आणि डोक्यावर मुकुट याशिवाय इतर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत.
वैनायकीबद्दल मूर्तिशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये (अपवाद श्रीकुमाररचित शिल्परत्न) जास्त माहिती मिळत नसल्यामुळे तिच्याभोवती एक वेगळेच गूढवलय निर्माण झाले आहे. वैनायकीचे कोडे सोडवायचे असेल तर अजून संशोधन होणे गरजेचे आहे आणि ह्या संशोधनातूनच वैनायकीची नवीन माहिती उजेडात येईल.
भुलेश्वर
भुलेश्वर
---------------
देवगिरीकर यादव यांच्या काळात महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली, त्यातीलच भुलेश्वर हे एक यादवकालीन शिल्पवैभवाचा देखणा नमुना असलेले शिवमंदिर. पुरंदर तालुक्याच्या क-हापठावर सह्याद्रीच्या दोन पर्वतरांगा एकमेकाला संमातर अशा पुवर्व पश्चिम पसरलेल्या आहेत. उत्तर दिशेच्या पर्वतरांगेवरील पुर्वेच्या टोकाला दौलतमंगळ किल्ला दिमाखात उभा आहे. याच किल्ल्यावर भुलेश्वर मंदिर आहे. पुरंदर तालुक्याचे शेवटचे टोक माळशिरस गाव असून, भुलेश्वरचे प्राचीन दिमाखदार वैभव पिढ्या न पिढ्या गावाने साभांळले. प्रत्येक माणसाच्या मनात या मंदिराची शिल्पकला आणि शंभुमहादेवाच्या प्रति मनात श्रद्धा आहे.
तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले आहे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेवर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. गजनीच्या महंमदाने केलेल्या आक्रमणावेळी बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. महिनाभर यात्रा असते. परिसरातून मानाच्या कावडी येतात. चैत्री बारशीलाही मंदिरासमोर मानाच्या कावडी नाचवल्या जातात. ही जुनी परंरपरा आहे. या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करुन यादवकालीन भुलेश्वर हे पु्स्तक लिहिले आहे.महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही आहे.
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता. नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. तुकोजी होळकर यांच्या काळात पुढील नगारखान्याचे बांधकाम झाले.
मंदिराची रचना -मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग इतर मंदिरापेक्षा जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
दौलत मंगळगड- १६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला बांधला, (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. जीर्णोद्धारामुळे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओव-या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्स्रनामात या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. भुलेश्वर मंदिर हे पुरातत्वखात्याने ताब्यात घेतले असून राष्ट्रीय संरक्षक म्हणून जाहीर केले आहे. पुण्यापासून पन्नास किमी अंतर आहे. सासवड व यवतहूनही मंदिराकडे येण्यासाठी रस्ते आहेत. गडाच्या पायथ्याला भुलेश्वर वन उद्यान गावाच्या गायरान जमिनीत उभे आहे. पायथ्याला मोठी वसाहत होती. त्याच्या खाणाखुणा आजही लक्षवेधून घेतात. ढासळलेली मसजिजदही लक्ष वेधून घेते. हिरव्यागर वनराईने नटलेला परिसर व शिल्पसौदर्यांचा अनोखा नजराना खिळवून ठेवतो.
भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
बरेच दिवस समाधी अवस्थेत असलेल्या ब्लॉगला आज काही प्रमाणात संजीवनी मिळेल असे वाटत आहे. मनात साचलेले खूप आहे पण खरडायला काही वेळ मिळत नाही. नवीन नोकरी आणि कांदे-पोहे कार्यक्रम या दोन्ही गोष्टी अश्या काही मानगुटीवर बसल्यात की गुडघे पार दुखून जातात. ( यातले कोणाला किती कळले माहित नाही,मला काहीच कळले नाही असो. )
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
तर आमचा प्लान होता पुणे-> यवत-> भुलेश्वर->माळशिरस-> पांडेश्वर-> सासवड->पुणे. आणी ते पण बाईक वर. "माझ्या बाईकची दोन्ही चाके फिरतात आणी ब्रेक लावला की थांबतात." असा एका वाक्यात तिच्यावर निबंध होऊ शकेल. असो.
यवत पासून उजवीकडे एक फाटा फुटतो. रस्त्यावरच भुलेश्वर मंदीर अशी पाटी लावलेली दिसते. पुण्यापासून यवत ५५ किमी आणि तेथून बोपदेव घाटातून भुलेश्वर १५ किमी.बोपदेव घाट संपला की लगेच एक फाटा फुटतो तेथून उजवीकडे भुलेश्वर मंदीर.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा ढग भरून आलेच होते. मस्त हिरवागार,निर्जन परिसर, हलकासा पाऊस. मजा आली. हलकाश्या पाऊसात निवांत गाडी चालवत गप्पा टप्पा करत चाललो होतो. एखाद दुसरी दुधाची गाडी ये जा करत होती.
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.
येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.
प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प.
या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.
ऐरावातावळ
प्रत्येक शिवमंदिरात प्रवेशद्वाराशी कासव का असते याचा अभ्यास करायला हवा. मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पण सोमेश्वर मंदिरात असेच कासव होते.
मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
महानंदी
मुख्य मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते महानंदीचे. मंदिराच्या मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. प्रत्येक अन प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक डिटेल काम पाहून डोके चक्रावून जाते.
महाभारतातील अर्जुन-कर्ण युद्धाचा प्रसंग.
युद्ध दर्शवताना हवेत मारलेले बाणही स्पष्ट दिसतात.
Daulatmangal fort is believe to be built during Yadav dynasty. Area of the fort is not as large as that of other sahyadri forts. All the fortification on the fort has been destroyed except remnants of a entry bastion and another door like structure.
The famous thing on this fort is temple of Bhuleshwar. It is the Lord Shiva temple, built in 1200AD.
What would be a superb architecture during its glorious days! All the sculptures are now in very bad shape because Aurangzeb's army destroyed all the Hindu temples along with its sculptures.
How to reach
It is 47Km from Pune. You can reach wither by Solapur highway or via Saswad.
I) Pune- Hadapsar-Loni Kalbhor-Uruali Kanchan- Yawat(Just before Yawat city , you need to take right turn from the highway. You can ask directions for Bhuleshwar. It is 8 Km from Yawat. Road condition is quite good and it is shortest possible route from Pune.
II) Pune-Hadapsar-Saswad-Pargaon Memane-Pisarve-Bhuleshwar. This route is longer than previous one. Route is single lane throughout.
कलारसात भुलवणारं भुलेश्वर! |
5-6 minutes
गड-कोटांचे संवर्धन हा जसा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे तसाच तो जिव्हाळ्याचाही बनला आहे. महाराष्ट्रातले नेमके गड-कोट किती? यापेक्षा त्यातले सुस्थितीत किती? हे प्रश्न आपल्या स्वाभिमानी मनाला जास्त टोचतात. याला कारणच तसं आहे म्हणा! महाराष्ट्राच्या मातीला या गड-कोटांवरच्या इतिहासाचा नेहमीच अभिमान वाटत आलाय; परंतु आपल्या सर्वाच्या नाकत्रेपणामुळेच आणि दुर्लक्षितपणामुळेच एकेकाळी वैभवात नांदणारे गड-किल्ले आज उपेक्षिताचे जीवन जगत आहे. एकेकाळी मराठी सत्तेचा कारभार पाहणारे बहुतांशी किल्ले तर अगदी शेवटची घटका मोजत आहेत. यापैकी काही तर नामशेष झाले सुद्धा! अस्तित्व संपलेल्या या किल्ल्यांना अक्षरश: कागदातूनच शोधावे लागणार आहे, यात शंका नाही. असाच एक इतिहासकालीन पुण्याजवळील किल्ला पूर्णत: नामशेष झाला असून हा किल्ला आता केवळ डोंगर म्हणनूच उभा आहे. दौलतमंगळ असं याचं देखणं नाव!
BHULESHWAR_MANDIR
हा दौलतमंगळ अक्षरश: शेवटची घटका मोजत कसाबसा उभा आहे. या किल्ल्याच्या बाबतीत समाधानाची एकच गोष्ट म्हणजे, या किल्ल्यात असलेलं एक प्राचीन आणि तितकंच सुंदर शिवमंदिर अजूनही तग धरून आहे. म्हणूनच या डोंगरावर अनेक शिवभक्त शंकराच्या िपडीच्या दर्शनासाठी येत असतात, पण बहुतेकांना येथेच एक किल्ला होता असे म्हटले तरी पटणार नाही इतकं भीषण वास्तव या किल्ल्याच्या बाबतीत इथं घडलंय.
ब-याचदा फिरायला जायचे कोठे, त्याचे अंतर किती या प्रश्नांचा गुंता सोडवता-सोडवता आपले भटकणे राहून जाते. आणि नपेक्षा काहीतरी-कोठेतरी फिरूच म्हणून गजबजलेली ठिकाणे पाहिली जातात. म्हणूनच आपल्या इतिहासाचा जर अभ्यास आणि वाचन केले तर काही सुंदर नावे नक्कीच आपल्यासमोर येतील. दौलतमंगळचा डोंगर हे याच पंक्तीत भर घालणारं नाव आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतच्या अलीकडे उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. हा फाटा थेट माळशिरस नावाच्या गावात जातो. या गावात आलो की, एक डोंगर आपल्यासमोर ठाण मांडून उभा असतो. हा डोंगर जसजसा जवळ करू लागतो, तसतसं या डोंगराचा पडदा बाजूला होऊ लागतो. समोर येणारे बुरूज, दर्गा, तटबंदीचे अवशेष, पायरीमार्ग हे समोर येऊ लागतात. अन् मग आपल्या लक्षात येऊ लागते की, येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता. खरंच आहे हे. हा डोंगर म्हणजेच पूर्वीचा दौलतमंगळ किल्ला! विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी सन १६३४मध्ये बांधल्याची नोंद मिळते. हा गड इतिहासात काही प्रसिद्ध पावला नाही किंवा यावर काही घडामोडीही घडल्या नाहीत; पण हा किल्ला आपल्या उदासीनतेचं आणि दुर्लक्षतेचं एक सुंदर प्रतीक ठरला. कारण हा किल्ला आता पूर्णपणे नामशेष झाला आहे. याची खंत ना कोणालाच.. असो याचे अवशेष पार करत आपण डोंगरावर आलो की मग भुलेश्वरचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर घेऊन उभं असल्यासारखं वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसंजसं जवळ येऊ तसंतसं अधिकच खुलताना वाटू लागतं.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच द्वारपाल जय-विजय, पाय-यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते. शिखरावरील चुन्याच्या बांधकामावर गणेश, विष्णू आदी देवतांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो.
या मंदिरात प्रवेश करताक्षणीच आतापर्यंत काबूत ठेवलेल्या आपल्या ओठातून लाजवाब, भारी, खूपच सुंदर.. असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते. मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून, मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभूषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल. नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची सुरेख िपड आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाहय़ िभतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट कोरलेला दिसून येतो. या शिल्पाकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे पाहू आणि किती पाहू.. यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं स्त्रीमध्ये दाखवलेलं रूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते? समाधान, विरंगुळा, ऊर्जा, मनाला छेडणारी तार.. हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या सौंदर्यतेच्या मापदंडाचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसुकच या सौंदर्यतुषारात भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात ‘भुलवून’ सोडणारं हे भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा.
औरंगाबाद नुसते उच्चारले तरी लगेच वेरूळचे कैलासलेणे, अजिंठा लेण्यातील चित्रे, देवगिरीचा किल्ला आणि घृष्णेश्वर मंदिर हि पर्यटकांनी गजबजलेली ठिकाणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. तशीच पर्यटकांनी गजबजलेली अनेक ठिकाणे पुण्याच्या आहेत, उदा. बनेश्वर, सिंहगड, तोरणा, वढू-तुळापुर, शिवनेरी, भीमाशंकर, इ. पण ह्या सर्व ठिकाणहून वेगळे असे पाहायचे असेल तर आपल्याला आपली पाऊले पुणे-सोलापूर महामार्गावरील भुलेश्वरला वळवायला लागतील. ज्याप्रमाणे वेरुळचे कैलासलेणे, तसेच यवतेश्वरच्या माथ्यावर वसलेले भुलेश्वरचे शिवमंदिर.
पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून साधारणपणे ५५ कि.मीवर भुलेश्वर हे यवतेश्वर टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर यादवकाळात साधारणपणे बाराव्या शतकात मध्ये बांधलेले आहे. पण मूर्तिभंजक आक्रमकांनी मंदिर आक्रमण करून मंदिर उद्धवस्त केले व नंतरच्या काळात पुन्हा बांधले असावे (कारण मंदिराचे प्रवेशद्वार शिवकालीन गोमुखी प्रकारचे असून १३ व्या शतकात अश्या गुप्त दरवाज्याची काहीच गरज नव्हती, तसेच काही ठिकाणी भाजलेल्या विटांचा वापर केलेला आहे). भुलेश्वर मंदिराला दौलत मंगल किल्ल्याने आपल्यात सामावून घेतले आहे. हा किल्ला आदिलशाहाचे सरदार मुरार जगदेव यांनी बांधला आहे. काळाच्या ओघात दौलत मंगल किल्ला उद्धवस्त झाला, पण भुलेश्वर मंदिर सर्व आक्रमणांना तोंड देत उभे राहिले. दौलत मंगल किल्ल्याचे काही बुरुज आणि प्रवेशद्वार अजूनही साबूत आहेत.
पुण्याहून सोलापूरला जाताना यवतच्या अलीकडे दोन कि.मी अंतरावर भुलेश्वर फाटा आहे. भुलेश्वर डोंगराकडे जाणारा हा रस्ता दोरगेवाडीनंतर एकदम मोकळा आहे. मधूनच एखादे वाहन गेले तर, नाहीतर ह्या रस्त्याने जाणारी वाहने फार कमी. पावसाळा सोडला तर हा परिसर तसा रुक्ष. दोरगेवाडीतूनच डोंगरमाथ्यावरील भुलेश्वर मंदिर आणि त्याशेजारी असलेला दूरसंचार विभागाचा मनोरा आपल्याला खुणावत असतात. महामार्गापासून सुमारे १०कि.मीचे अंतर पार केल्यानंतर आपण भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी येतो आणि इथून पुढे सुरु होतो वळणावळणाचा कठीण घाट. घाट पार केल्यानंतर आपण माथ्यावर असलेल्या पठारावर येऊन पोहोचल्यानंतर आपले लक्ष वेधून मंदिराचे कळस आणि दौलत मंगळ किल्ल्याचे मागे उरले अवशेष. मंदिराकडे जाताना मंदिराच्या खालच्या अंगाला असलेल्या घळीत ताशीव दगडात बांधलेले प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून जाणारा पायऱ्यांचा रस्ता हा बहुधा जुन्या काळातील किल्ल्यावर जाणारा मुख्य मार्ग असावा. प्रवेशद्वाराच्या जवळच थंडगार पाण्याचे टाके आहे.
भूलेश्वर मंदिर भव्य असून, एका पठारावर उभारले आहे. मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे. पठारावर वाहने उभी करण्यासाठी भरपूर जागा असून, मंदिराच्या मागच्या बाजूस दूरसंचार विभागाचा मनोरा आहे. चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी असलेल्या पायऱ्यांच्याइथे असलेल्या द्वारपालांच्या मुर्त्या आपले लक्ष वेधून घेतात. शिल्पकाराने द्वारपालांच्या अंगावर असलेले दागिने फार उत्तम कोरले आहे. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करीत आहे असे शिल्प कोरले आहे. मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून नागर शैलीत बांधलेले आहे. मंदिर गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि नंदीमंडप असे चार भागात विभागेले आहे. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतरच्या काळात बांधले असावे. शिखरावर अनेक पौराणिक प्रसंग, देवादिकांच्या मूर्ती आणि विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत.
मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवर आहे. फरसबंद आवाराजवळ आणखीन एक मंदिर आहे. आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूना प्रवेशद्वारे आहेत. या दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या सहाय्याने हवा खेळती ठेवली आहे. शिवाय आतील बाजूस उतुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा ऐन उन्हाळ्यातही टिकून असतो. हा सभामंडप मुख्य मंदिरापासून वेगळा करणारी आडवी भिंत आत आहे. अश्या आद्य भिंतीची रचना डोंगरी किल्ल्यावर आत येणाऱ्या शत्रूला चकवा देण्यासाठी केलेली असते. या आडव्या भिंतीमुळे पुढचा मार्ग दिसत नसल्यामुळे नवखा माणूस गोंधळून जातो. पण काळजीपूर्वक बघितल्यास याच अंधारी भागात डाव्या-उजव्या बाजूला वर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसतात. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर काय बघायचे आणि काय नाही बघायचे अशी आपली अवस्था होते. या मंदिरात आपल्याला कोरीव कामाशिवाय काहीही दिसत नाही. मंदिरात एकही कोपरा किंवा भिंत कलाकृतीशिवाय दिसणार नाही.
मंदिराच्या आतील तिन्ही बाजूना ओवऱ्या असून त्यांच्यावर शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या मध्यभागी गर्भगृह असून गाभाऱ्यात शंकराची रेखीव पिंड आहे. पिंडीजवळ पितळेची नागमुर्ती आहे. पिंडीसमोर असलेल्या खळग्यात भक्तिभावाने प्रसाद ठेवल्यास प्रसादाचा काही भाग देव ग्रहण करतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूस कीर्तिमुखे कोरलेली आहेत.
शंकराचे दर्शन घेऊन आपण जेव्हा सभामंडपात येतो तेव्हा काय बघू आणि काय नको अशी आपली अवस्था होते. सभामंडपाच्या तिन्ही बाजूना कोरीव कामची लयलूट आहे. सभामंडपात एकही असा मोकळा भाग नसेल जिथे कोरीव काम नाही आहे. गाभाऱ्यासमोर आहे स्वंतत्र नंदीमंडप. नंदीमंडपातील नंदीची मूर्ती सुस्थित असून मूर्तीवरील कोरीवकाम अप्रतिम आहे. नंदिमंडप आकाराने लहान असला तरी मंडपातील खांबांवर आकर्षक नक्षी काम आहे. नंदीमंडपातील खांबांच्या अग्रभागी यक्ष कोरलेले आहेत. मंदिरात जागोजागी हंस, लतावेल, मकर आणि कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात. मंदिरात ब्रम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे. मातृकांची आयुधे आणि वाहने स्पष्ट कोरलेली आहेत. मातृकानंतर रेलचेल आहे ती नृत्यांगना, वादक आणि सूरसुंदरींची.
मंदिरात महाभारत आणि रामायण यांचे भव्य शिल्पपट आहेत. रामायणातील शिल्पपटात राम-भारत भेट, सीता स्वयंवर, तसेच सीता विवाहप्रसंगी करतात तो गौरीहरपूजन हा सोहळा दाखवला आहे. या शिल्पातील सीतेच्या भावमुद्रा, तिचे आणि सख्यांचे अलंकार, तोरणे नुसती बघतच राहावीत. महाभारतातील शिल्पपटात अर्जुनाचा मत्स्यभेद, कौरव-पांडव युद्ध, भीष्म बाणांच्या शय्येवर दाखवले आहेत, भीम गदेने हत्तींना मारत आहे, इ. अनेक प्रसंग कोरलेले आहेत.
मुख्य मंदिराच्या बाह्यभागात दगडी घंटेची आरास आहे. हि सर्व शिल्प बघत असताना एक गोष्ट नजरेत पडते ती म्हणजे या शिल्पठेव्यातील एकही मूर्ती अखंड नाही आहे. निष्टुर मूर्तीभंजकानी इथली मूर्तींवर घणांचे घाव घालून कोणाचे हात, कोणाचे कान, कोणाचे मस्तक आणि कोणाचे दोन्ही पाय तोडलेले आहेत. मूर्ती अखंड नसल्या तरी मूर्तींचे शिल्पसौंदर्य कमी होत नाही.
विनायकी गणेश
भुलेश्वर मंदिरात आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे ते म्हणजे गणपतीचे. आपण नेहमी गणपतीला पुरुषरुपात पाहतो, पण येथील गणपती स्त्रीरूपात आहे. हा गणपती विनायकी किंवा लंबोदरी, गणेश्वरी किंवा गणेशानी, विनायकी गणेश इ. नावानी ओळखला जातो. स्त्रीरूपातील गणेशाचे पाटेश्वरनंतर भुलेश्वर हे दुसरे ठिकाण आहे. विनायकी गणेशाचे दोन शिल्पपट भुलेश्वर मंदिर आहेत. या दोन्ही शिल्पपटात गणेशानी आणि दोन मातृकांच्या बाजूने भगवान महावीरांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या दोन्ही शिल्पपटातील गणेशानी पद्मासनात आसनस्थ असून चारी हातात आयुधे धारण केलेली आहेत. पायाजवळ मूषक हे वाहनही कोरलेले आहे.
पुण्याचे वेरूळ शोभणाऱ्या भुलेश्वर एकदातरी भेट देऊन तेथील विनायकी गणेश आणि इतर अनेक शिल्पकृतींचे दर्शन घेतलेच पाहिजे. अखंड नसलेल्या तरीपण अप्रतिम वाटणाऱ्या ह्या शिल्पकृती बघताना त्या निर्माण करणाऱ्या अनेक अज्ञात कारागिरांना प्रणाम करण्यासाठी आपले हात आपोआप जोडले जातात.
भुलेश्वर मंदिर आणि त्याशेजार असलेला दूरसंचार विभागाचा मनोरा
भुलेश्वर मंदिर
दौलत मंगळ किल्ल्याचा बुरुज
दौलत मंगळ किल्ल्याचा बुरुज
ताशीव दगडात बांधलेले प्रवेशद्वार
पायऱ्यांजवळ असलेला द्वारपाल
पायऱ्यांजवळ असलेला द्वारपाल
वाघ हत्तीवर आक्रमण करीत असलेले शिल्प
दगडी चौथरा, मंदिराची भिंत आणि विटांनी भांधालेले शिखर
विटांनी बांधलेले शिखर
शिखरावरील पौराणिक प्रसंग
शिखरावरील गणेशमूर्ती
मत्स्यावतार
शेषसायी विष्णू आणि शेजारी विष्णूचे सेवा करणारी लक्ष्मी
शस्त्रधारी देवी. देवीने दोन हातात कट्यार आणि दोन हातात तलवार धारण केलेली आहे.
मुख्य मंदिराजवळील आणखीन एक मंदिर
गर्भगृह
नंदी
नंदी आणि नंदीमंडप
नंदी आणि नंदीमंडप
यक्ष
कीर्तिमुख
नर्तक
वादक
वादक
विनायकी गणेश
विनायकी गणेश शिल्पपट
बाणांच्या शय्येवर भीष्म
कौरव-पांडव युद्ध
हत्तीधारी भीम
अर्जुनाचा मत्स्यभेद
मारीच वध
सीता स्वयंवर व गौरीहरपूजन सोहळा
राम-भारत भेट
गणपती
गणपती
नर्तकी
दगडी घंटेची आरास
पशुपतीनाथ शिल्पपट
भैरवी मातृका शिल्पपट
अनामिक देवता
अनामिक देवता
अनामिक देवता
अनामिक देवता
हत्तींचे युद्ध
खांबांवर कोरलेले हंस
गणपती आणि बाजूने भगवान महावीरांच्या मुर्त्या
सिंह
सिंह
at July 07, 2020
Newer PostOlder PostHome
जळगाव जिल्ह्यातील गड
http://omkarkelkar.blogspot.com/2018/03/blog-post.html किल्ले बहादरपूर 6–7 minutes ..
Bhuleshwar Temple भुलेश्वर शिवमंदिर
One of the popular Hindu temple of Lord Shiva near Pune, also called Mangalgad. It is not only know for its religious importance but architecture, sculpture too. The Sculpture are very beautiful but remained in demolished form.
How to Reach : i) Pune-Solapur highway- Loni Kalbhor -Uruli Kanchan - Yavat-(50km) right turn to Saswad road - Malshiras ghat- (8km) right turn - Bhuleshwar Temple ( 58km). The road has toll.
ii) Pune- Saswad - left turn to Yavat/ Malsiras road - Vanpuri - Vaghapur - Rajewadi- Malshiras village - left turn to Bhuleshwar Temple road (60km apporx.)
Both ways are good for vehicle. Via patas will less time because of highway. But it depends from which part of Pune you start for Bhuleshwar Temple.
Malshiras ghat
Parking : Ample place of parking available for bikes and cars. buses can be park carefully. Free Parking.
Food : Packed food and water bottles are available on small stall. Full meal is available only one special festivals of lord Shiva.
Entry Fee : There is nominal entry charges are taken by per vehicle Rs. 10 to 50.
Posted by Suresh Isave
भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट
मिपावर ह्याआधी यवतच्या यादवकालीन भुलेश्वर मंदिरावर असंख्य लेख तसेच छायाचित्रे येऊन गेलीत. पण इथल्या पौराणिक शिल्पपटांचे फारसे वर्णन आल्याचे मात्र अजिबात दिसले नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे मी मंदिराचे इतर वर्णन न देता येथील काही पौराणिक शिल्पपट उलगडून दाखवण्याचा मात्र अल्पसा प्रयत्न करतोय. रामायण, महाभारतातील प्रसंगांच्या शिल्पपटांबरोबरच येथील काही आगळीवेगळी शिल्पेही आपण विचारात घेऊयात.
भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे प्रत्येकी तीन शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना. पैकी डाव्या बाजूला रामायण तर उजवे बाजूस महाभारत शिल्पपट आहेत. पैकी महाभारताचे तीन शिल्पपट संपूर्ण आहेत मात्र सध्याच्या जागेवर रामायणाचा एकच पट चांगल्या स्थितीत अस्तित्वात असून इतर दोन पट सध्याच्या जागेवर नाहीत. पैकी त्या उरलेल्या दोन पटांचे काही तुकडे (fragments) मात्र आपल्याला मंदिरातच इतरत्र चुकीच्या जागी जोडलेल्या स्थितीत पाहण्यास मिळतात जे शोधण्यास खूपच जिकिरीचे आहे.
चला तर एकेक शिल्पपट पाहूयात. रामायणपटापासून सुरुवात करुयात.
इस्लामी वावटळीत मंदिराची झालेली नासधूस आणि नंतर पेशव्यांचे गुरु ब्रह्मेन्द्रस्वामी यांनी केलेला मंदिराचा जीर्णोद्धार यात हे रामायणाच्या शिल्पपटांचे तुकडे चुकीच्या जागी बसवले गेले.
रामायणपटाचा पहिला तुकडा आपल्याला दिसतो तो मंदिराच्या बाहेर. पायर्यांनजीकच्या उजवे बाजूच्या भिंतीत. ह्याच भिंतीत शैव द्वारपालांच्या प्रतिमा सुद्धा बसवलेल्या आहेत.
दोन धनुर्धारी पुरुष आणि पाठीमागे एक भग्न स्त्री प्रतिमा असा हा प्रसंग. बहुधा राम लक्ष्मण आणि सीता. हा रामायणातला प्रसंग आहे याबद्दल मला यत्किंचितही शंका नाही मात्र हा प्रसंग नेमका कुठला हे ओळखणे अवघड आहे. बहुधा राम, लक्ष्मण आणि सीता वनवासाला निघाल्याचा हा प्रसंग असावा.
१. राम, लक्ष्मण आणि सीता
a
यानंतर आपल्याला दुसरा शिल्पपट थेट मंदिराच्या सभामंडपातच दिसतो. नंदीमंडप आणि सभामंडप यामधील डाव्या बाजूने काटकोनात वळताच उजव्या हाताला हा रामायणाचा अखंड शिल्पपट आहे. हा पट बराच विस्तृत असून पाच भागात कोरलेला आहे. मध्यभागी राम लक्ष्मण आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूंना प्रत्येकी २/२ प्रसंग कोरलेले अशी याची रचना. अगदी अशाच पद्धतीचा महाभारतातील एक शिल्पपट याच्या बरोबर विरुद्ध बाजूस आपणास दिसतो तो आपण पुढे पाहूच.
२. रामायण अखंड शिल्पपट
a
आता यातील एक एक प्रसंग आपण विस्ताराने पाहूयात.
मध्यभागी जे दोन धनुर्धारी दिसत आहेत ते बहुधा राम-लक्ष्मण असावेत. माझ्या मते हा प्रसंग सीतास्वयंवराच्या आधीचा असावा. कारण राम लक्ष्मण हे दोघेही दागदागिने तसेच राजवस्त्रांमध्ये येथे आहेत. विश्वामित्रांसोबर त्राटिका वध तदनंतर मिथिला नगरीच्या प्रवासापर्यंतचा हा प्रसंग असावा. नक्की कुठला ते मात्र सांगता येत नाही.
उजवे बाजूच्या खालच्या पटात अग्नी हा दशरथाला पायसदान देत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे. तर त्याच्या शेजारी उजवीकडे एक स्त्री आपल्या सेविकांसह शिवलिंगाची पूजा करताना दाखवली आहे. ही बहुधा कौसल्या असावी जी अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करत आहे किंवा हा संपूर्ण वेगळाच प्रसंग असून ती स्त्री ही सीता असावी जी सुयोग्य पतीसाठी प्रार्थना करत आहे. दुसरी शक्यताच मला अधिक योग्य वाटते.
याच्या वरच्या शिल्पपटात रामाकडून धनुर्भंग होतो आहे आणि सीता ही वरमाला घेऊन स्वयंवरासाठी सज्ज असल्याचे दाखवले आहे. उजवीकडे जनक हा सिंहासनावर बसलेला असून रामाच्या डाव्या बाजूला मृगाजीनात दाढीवाला विश्वामित्र व लक्ष्मण अगदी स्पष्ट दिसतात. त्यांच्याच शेजारी सांडणीस्वार सीतास्वयंवराची दवंडी पिटत असताना दाखवले आहेत.
३. रामायण शिल्पपट (उजवी बाजू -पायसदान (खालचा पट) व सीतास्वयंवर (वरचा पट) )
a
मध्यभागातील राम-लक्ष्मणांच्या डावीकडे असेच दोन शिल्पपट आपणास दिसतात.
यातील दोन्ही प्रसंग नक्की कुठले हे ओळखू येत नाहीत पण बहुधा हे प्रसंग रावणवधानंतर राम सीतेसह अयोध्येला परत येतात तेव्हाचे असावेत. कारण हे दोघेही आसनस्थ असून सेवक उभे आहेत तर वानरांनाही उच्चासन दिलेले असून ते हात जोडून नम्र भावाने बसलेले दिसतात.
४. रामायण शिल्पपट (डावी बाजू)
a
यानंतरचे येथील सलग असलेले दोन शिल्पपट मात्र गायब आहेत. पैकी त्यातील एक भाग जो पायर्यांपाशी असलेल्या भिंतीत आहे तो आपण यापूर्वीचा पाहिला आहे. यातीलच दुसरा एक शिल्पपट येथेच नंदीमंडपाच्या उजवीकडील भिंतीत छताच्या खालच्या बाजूला आणि छताला जोडून असा लावलेला असल्याचा आपणास दिसतो. तर अजून एक भाग भाग याच्या बरोबर समोरील बाजूस छताच्या खालीच असा दिसतो. हे दोन्ही पट पूर्णपणे अंधारी आणि चुकीच्या जागेत लावलेले असल्याने शोधणे तसे जिकीरीचेच आहे. काही मिपाकरांनी आमच्या सोबत ह्या दोन्ही पटांचे दर्शन घेतलेले आहे.
त्यातीलच एक नंदीमंडपाशेजारील भिंतीत असलेला पट म्हणाजे मारीचवध.
पटाच्या उजव्या बाजूस सुवर्णमृगाचे रूप ल्यालेल्या मारीचाचा वध राम करत आहे. मृगाच्या धडातून राक्षसदेहधारी मारिच प्रकट होत असून मृगशीर खाली पडलेले आहे. मरताना रामाच्या आवाजात 'लक्ष्मणा धाव' असा आर्त टाहो फोडल्यामुळे भयशंकित झालेल्या सीतेने लक्ष्मणाला रामाचा परामर्श घेण्यासाठी पाठवलेले आहे आणि ही संधी साधून ऋषीवेषातील कमंडलूधारी रावण रामकुटीसमोर सीतेला भि़क्षा मागण्यासाठी पुढे आला असून सीता त्याला भिक्षा देण्याच्या अगदी बेतात आहे.
५. मारिचवध
a
ह्याच्या समोरील पट मात्र मी भुलेश्वरच्या असंख्य वार्या करूनही अजूनही संपूर्णपणे बघू शकलो नाही किंवा ओळखू शकलो नाही. ह्या पटात वृक्ष्, त्यावर वानरे, पक्षी आदी दाखवलेले असून काह्ली वनांमध्ये प्राणी दाखवलेले आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे मात्र ह्यात सुग्रीवाच्या किष्किंधानगरीतला किंवा रावणाच्या अशोकवनापैकी एखादा प्रसंग असू शकेल.
६. हाच तो अगम्य शिल्पपट
a
इथे रामायणातील शिल्पपट पूर्ण होतात. यातील एकच अखंड असून इतर दोघांचे काही अंशच सध्या इतस्ततः पाहता येतात.
आता वळूयात महाभारतातील शिल्पपटांकडे.
महाभारतातील शिल्पपट मात्र संपूर्ण आणि सलगपणे आजही बर्यापैकी चांगल्या अवस्थेत आहेत. पैकी एक अखंड पट हा द्रौपदी स्वयंवराचा असून हा सभापर्वातील आहे तर इतर दोन पट हे भारतीय युद्धातील भीष्मपर्व, द्रोणपर्व आणि शल्यपर्व ह्या पर्वांमधील आहेत.
रामायण पटाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूपासून हे पट सुरु होतात.
आधी आपण द्रौपदी स्वयंवर शिल्पपट पाहूयात.
ह्यातही रामायणातील अखंड पटाप्रमाणेच पाच प्रसंग कोरलेले असून मध्यभागी अर्जुनहस्ते मत्स्यभंग असून दोन्ही बाजूला खालीवर असे दोन दोन पट कोरलेले आहेत.
७. द्रौपदीस्वयंवर संपूर्ण शिल्पपट
a
यातील आता उजवीकडचे दोन पट आता आपण पाहूयात.
यातील सर्वात उजवीकडे द्रुपद राजा हा सिंहासनावर बसलेला असून खालच्या बाजूला द्रौपदीची शिवपूजा दाखवलेली आहे.
द्रुपदाच्या डाव्याकडे शंख चक्र गदा, पद्मधारी श्रीकृष्ण द्रुपदाशी बोलताना दाखवलेला आहे. भुलेश्वर मंदिरातील हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे जे की येथील शिल्पांमध्ये श्रीकृष्णाला त्याच्या विष्णूरुपी दैवी स्वरुपात दाखवते.
कृष्णाच्या डावीकडे तीन पांडव आहेत. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव, ज्यांची वेषभूषा मृगाजिने धारण केल्यामुळे ऋषींसारखी आहेत. नुकतेच ते वारणावतातील लाक्षागृहातून सुटून आल्याने ते ओळख लपवण्यासाठी मृगाजिने धारण करुन द्रौपदी स्वयंवर पाहण्यासाठी आलेले आहेत. अर्जुन मात्र मत्स्यभंग पण पूर्ण करण्यासाठी सज्ज असल्यामुळे तसेच भीम हा त्याच्या संरक्षणासाठी गेल्यामुळे ह्यात तीनच पांडव दाखवलेले आहेत. पांडवांच्या बाजूला द्रौपदी हाती वरमाला घेऊन सज्ज असून तिच्या शेजारी बंधू खङगधारी दृष्टद्द्युम्न आहे.
८. द्रौपदीस्वयंवर पट (उजवीकडील बाजू)
a
यानंतर मधल्या पटात अर्जुन खालच्या पाण्यात बघून वरच्या बाजूस चक्राकार फिरत असलेल्या मत्स्याचा नेत्र भंग करण्यासाठी प्रत्यंचेला बाण जोडून सज्ज आहे. अर्जुनाचा मृगाजीनधारी वेष स्पष्ट दिसतोय.
९. अर्जुनकृत मत्स्यभंग (मधली बाजू)
a
डाव्या बाजूच्या शिल्पपटामध्ये द्रौपदीस्वयंवरानंतर अर्जुन हा द्रौपदीला घेऊन कुंतीकडे आलेला असून भिक्षा आणलीय असे म्हणून द्रौपदीची ओळख कुंतीला करून देत आहेत. तर त्याच्या बाजूला डावीकडे व्यास मुनी हे द्रौपदीचा पाच पतींशी विवाह कसा समर्थनीय आहे हे कुंतीला पटवून देत आहेत असे वाटते.
ह्याच्याच खालच्या बाजूला कृष्ण आणि कुंतीसह इतर पांडवांची भेट दाखवलेली आहे.
१०. द्रौपदीस्वयंवर (डावी बाजू)
a
याच्या शेजारचा एक पट मात्र द्रोणपर्वातील आहे जो आपण नंतर पाहू. सुरुवातीला आधी आपण भीष्मपर्वातील पट पाहू ज्यात भीष्मवधाचा प्रसंग कोरलेला आहे. हा पट नंदीमंडपाच्या समोर असलेल्या सभामंडपाच्या उजव्या बाजूने सुरु होतो.
हा शिल्पपट सुरु होतो अर्जुन भीष्म यांच्या युद्धापासून. ह्या शिल्पपटांछ्या रथींच्या प्रतिमा भंग झाल्यात पण त्यांच्या ध्वजांवरुन ते योद्धे अगदी सहजी ओळखू येतात.
ह्या पटात अर्जुन भीष्माशी शरयुद्ध खेळत आहे. सारथी कृष्ण चततुर्भुज विष्णूरूपात असून अर्जुनाच्या ध्वजावर वानर आहे. तर त्याच्या समोर भीष्म तालध्वजासह रथावर आरूढ आहे.
११. अर्जुन -भीष्म युद्ध
a
ह्याच्या पुढचा पट आहे तो भीष्म वधाचा.
कितीही प्रयत्न करूनही भीष्म अवध्य असल्याचे बघून रात्री कौरवशिबिरात जाऊन पांडव भीष्मालाच त्याच्या वधाचा उपाय विचारतात तेव्हा भीष्म पूर्वी स्त्री असलेल्या शिखंडीशी मि युद्ध करणार नाही असे म्हणून अप्रत्यक्षपणे शिखंडीच्या आडून युद्ध करण्याचे पांडवांना सुचवतात.
ह्या पटात डावीकडे तालध्वजासहित भीष्म असून उजवीकडे कपीध्वजधारी अर्जुन आहे अर्जुनाच्या पुढ्यात शिखंडी त्याच्या मेषध्वजासह भीष्मावर शरवर्षाव करताना दिसत आहे. सध्या जरी भग्न असले तरी मूळतून अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे.
१२. भीष्मवध
a
यांनंतर ह्याच्या उजवीकडचा जो शिल्पपट आहे तो आहे भीष्म शरशय्येचा.
भीष्म हा शरशय्येवर पडलेला असून त्याच्या आजूबाजूला कौरव पांडव हे शोक व्यक्त करत बसलेले आहेत. अर्जुन मात्र उभा असून तो भीष्माला तहान लागली म्हणून भूमीत बाण मारून पाणी काढण्याच्या अविर्भावात आहे.
१३. भीष्म शरशय्या
a
यानंतरचा शिल्पपट आहे द्रोणपर्वातील. जो भीष्मपर्व आणि द्रौपदी स्वयंवर यामधील भागात आहे.
१४. द्रोणपर्व (संपूर्ण शिल्पपट)
a
यातील पहिल्या प्रसंगात एक द्रोणाचार्य आहेत हे निश्चित जे त्यांच्या सुवर्णमय कमंडलू च्या ध्वजावरुन समजून येते. त्याच्याशी युद्ध करणारा पांडवयौद्धा बहुधा खङगधारी दृष्टदद्युम्न किंवा मेष ध्वजधारी शिखंडी असावा.
१५. द्रोण व पांचालवीराचे युद्ध
a
ह्यानंतर कपीध्वज अर्जुन एका कौरवाबरोबर युद्ध करताना दाखवलेला असून कौरवयोद्ध्या त्याच्या ध्वजासहित भग्न असल्याने ओळखू येत नाही. ह्याच्या पुढचे शिल्प मात्र अतिशय रोचक आहे. द्रोणपर्वात अर्जुनाची खबरबात घ्यायला जाताना एकटा भीम कौरवांच्या महाप्रचंड सैन्यात घुसतो तो एकेका हत्तीलाच आपल्या बाहूंच्या साहाय्याने उचलून फेकतच.
एकेक करुन हत्ती भीमावर चालून येत आहेत आणि भीम त्यांना भिरकावून देत देत मार्गक्रमण करत चालला आहे. भीमाच्या भग्न झालेल्या हाताची बोटे हत्तीच्या पायाभोवती घट्ट आवळलेली दिसून येतात.
१६. अर्जुन- कौरववीर युद्ध
a
१७. भीम-गजयुद्ध
a
ह्याच्या बाजूलाच पट आहे तो शल्यपर्वातला.
ह्यात एक पांडवयोद्धा दाखवला असून तो मी ओळखू शकलो नाही. त्याच्या ध्वजावर मनुष्याचे शिर आहे. असा ध्वजचिन्ह असलेला कुठलाही योद्धा मला माहितीत नाही. द्रौपदेयांच्या ध्वजांवर चंद्र, सूर्य, यम आणि अश्विनीकुमारांच्या प्रतिमा होत्या असा महाभारतात उल्लेख आहे पण तो ह्या आकृतीशी जुळत नाही.
शल्याचा वध युधिष्ठिराकडून होतो मात्र युधिष्ठिराच्या ध्वजावर नंद आणि उपनंद अशा नावाचे दोन मृदंग आहेत जे ह्या शिल्पाशी जुळत नाहीत. मात्र विरोधातला कौरववीर शल्य मात्र त्याच्या नांगरधारी ध्वजामुळे अगदी सहज ओळखू येतोय.
१८. शल्ययुद्ध
a
इथे भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट संपतात.
ह्याव्यतिरिक्त भुलेश्वर मंदिरातील काही आगळीवेगळी शिल्पे आहेत. यापैकी येथील छतांवर असलेली मातृकांची शिल्पे सर्वपरिचित असल्याने मी येथे त्याची पुनरुक्ती टाळत आहे. मात्र मंदिराच्या मागच्या डाव्या बाजूचे भिंतीवर चामुंडेचे एक भग्नावस्थेतील अप्रतिम शिल्प आहे.
प्रेतवाहिनी चामुंडा अस्थिपंजर देहासह उभ्या स्थितीत असून तिचा चेहरा भयानक आहे. ओठांतून दाढा बाहेर आल्या असून तिच्या पोटात विंचू आहे जो तिच्या राक्षसी भुकेचे प्रतिक आहे. पायांतळी प्रेत आहे.
इथल्या माझ्या सर्वाधिक आवडीच्या शिल्पांपैकी हे एक.
१९. चामुंडा
a
ह्या शिवाय भुलेश्वर मंदिरातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणाजे इथे इतके स्तंभ असूनही फक्त स्तंभाच्या मधल्या चौकटीवर शिल्प आहे. इतर सर्व स्तंभचौकटी ह्या शिल्पविरहीत आहेत.
ह्या चौकटीवर नर्तिक नृत्य करत असून दोन्ही बाजूंना वादक वादन करत आहेत.
२०. स्तंभचौकटीवरील एकमेव शिल्प
भुलेश्वर मंदिरातील अजून रोचक शिल्प म्हणजे एक आभासी शिल्प.
ह्यात तीन पुरुष असून ते एकमेकांना जोडलेले आहेत. आणि पाय मात्र चारच आहेत. म्हणाजे प्रत्यक्षात एकाच वेळी दोन पुरुष उभे असून ते पाय एकमेकांना जोडले असल्याने तिघा जणांचा आभास निर्माण करीत आहेत. हे अतिशय भग्न शिल्प असले तरी अशा प्रकारच्या शिल्पांचा पूर्वपरिचय असल्याने हे शिल्प ओळखू येतेय. चांगल्या अवस्थेत असताना हे शिल्प अतिशय देखणॅ असणार यात काहीच शंका नाही.
अशीच शिल्पे मी पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरात आणि पिंपरी दुमाला येथील सोमेश्चर येथील यादवकालीन मंदिरांत पाहिली आहेत.
२१. आभास निर्माण करणारे शिल्प
a
तुलनेकरीता अनुक्रमे ह्या पेडगाव आणि ह्या पिंपरी दुमाला येथील ह्या प्रतिमा बघा
२२.
a
२३.
a
आणि जाता जाता माझ्या सर्वाधिक लाडक्या हिच्याशिवाय भुलेश्वर वारी कशी काय पूर्ण होईल.
२४. हीच ती जगप्रसिद्ध दर्पणसुंदरी
a
a
भुलेश्वर, १२/१३ व्या शतकात खोदले गेलेले यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर.
भूमिज शैली असलेल्या ह्या मंदिरावर चालुक्य शिल्पकलेचा दाट प्रभाव आहे. यादवांनंतर ह्या मंदिराला वाईट दिवस आले. आदिलशाही सरदार मुरार जगदेवाच्या काळात ह्या मंदिराभोवतीच्या टेकडीवर कोट उभारून त्यास दौलतमंगळ हे नाव देण्यात आले. कोटाचे बुरुज आजही दृश्यमान आहेत. औरंगजेबाच्या दख्खन स्वारीत ह्या मंदिराची तोडफोड करण्यात आली, इथली अतिसुंदर शिल्पे घणांचे घाव घालून भग्न करण्यात आली पण इतकी तोडफोड झाली असूनही आजही त्यांचे मूळचे सौंदर्य काही लपत नाही.
१८ व्या शतकात ह्या मंदिराचे भाग्य पुन्हा उजळले. पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ह्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे मंदिराचा बाह्य भाग हा पेशवेकालीन आणि इस्लामिक अशा मिश्र शैलीचा बनला तर अंतर्भाग मूळ शैलीतच राहिला. पण ह्या जीर्णोद्धारात काही शिल्पपट चुकीच्या ठिकाणी बसवले गेले. मंदिरात बारकाईने पाहायला जाता हे चुकलेले शिल्पपट आपल्या नजरेस पडतात.
काय आहे ह्या शिल्पसमृद्ध मंदिरात?
विभिन्न शैलींचे मिश्रण, कोरीव स्तंभ, स्तंभावरील छत तोलून धरणारे विविध मुद्रांतील भारवाहक यक्ष आणि यक्षिणी, रामायण आणि महाभारतातील शिल्पपट, सप्तमातृका, प्रतिहारी आणि सुरसुंदरी
गाभार्यातील शिवपिंडि चा वरचा भाग सहज निघतो,व त्याच्या आत पेढे ठेवल्यानंतर ते गायब होतात्,असे तेथिल पुजारी सांगतो,वेळ आणी पेढे असल्यास पुजार्याला ते करायला सांगा.
सर्वात महत्वाचे .....यवत ला गोपाळकॄष्ण ची झणझणीत मिसळ विसरु नका.
भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात
रविवारी सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो.
भुलेश्वर हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्याच शिल्पांची पडझड झाली आहे. तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच. मंदिराचा बाह्यभाग इस्लामिक शैलीतला वाटतो आणि अर्थात मूळ मंदिरावर नंतर तो इस्लामिक राजवटीत बांधल्याचे दिसते ते नंतरची आक्रमणे रोखण्यासाठीच बहुधा.
एका अंधार्या वाटेने आपण मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश करतो आणी शिल्पांचा खजिनाच आपल्यासमोर उघड होतो. पुढे काय लिहू, प्रत्यक्ष बघाच.......
महाभारतातील धनुर्युद्ध.
गजयुद्धः भीम हत्ती उचलून फेकून देतांना..
तलवारयुद्ध..
विष्णूरूपी बाण
सिंह व हत्ती युद्ध
मंदिरावरून पाहताना
व शेवटी
Bhuleshwar AKA Daulatmangal Fort
Unknown
4 minutes
Bhuleshwar AKA Daulatmangal Fort
Type: Hill fortsGrade: Easy (You can drive till top)
Base Village: Off Urali Kanchan, beforeYevat
Distance: 45 KMs from Pune
Route: Pune-Solapur Road
Time visited: Feb 2011
Time to see around: 1 hour max
How to visit: From swargate hit Pune-Solapur highway. After the toll road ends at Urali-Kanchan, (2 Kms before Yevat) take right turn along eastern bank of canal. The fort should be around 8 Km. There is small ghat but the road is good condition. This raod further goes down to Saswad. There is right side diversion just as the Ghat ends and a bumpy road with pretty steep with sharp turn’s lead you right till the temple on the top of the fort.
Every time I visit Solapur I promise myself that I need to take out time and visit Bhuleshwar temple on the Daulatmangal fort. This Sunday finally I headed for this amazing place. Started at 6.45/7 we hit the cool breezy road. The Sun was out smiling as the sleepy traffic moved calmly at Magarpatta and Hadapsar.
After the toll ended we stopped at our favourite stop- Kanchan for steamy breakfast. Mouth-watering Hot Idlis and Dosa on fresh green leaf with yummy sambar recharged our energy that we would need for next few hours. We strolled for few minutes in the Nishigand and Marigold farms on the opposite side.
I could easily locate Bhuleshwar behind the hotel. After turning on right the road from Solapur highway it become lonely amid the dry arid landscape. A few leafy green of mostly Banana and Papai farms are only ones that add beauty to the parched yellows and muddy browns. Well just at the ghat starts, the large number of misty Jacoranda tress adds the delightful voilets. Throughout this road, the temple is always visible in front of you.
The striking Buruj towers at both ends draw you attention. There are two connected towers probably now a home to a few people is at the centre. Not sure if these were built recently...
There is good stairway built from half of the fort to the temple but since the road is pretty steep with barely one vehicle could pass safely I could locate a place to park my car. We finally reached the top from the left side. I could locate 2 Buruj on the way. The fort is supposed to be built around the temple in 16th century by Murar Jagdev after he had looted Pune.
Bhuleswar Temple is very old and said to be built in 12th century by Choula Rulers. The temple is centrally located on a huge platform. The closer look of the roof towers highlights the magnificient artistic detailed designs.
भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात
रविवारी
सकाळी लवकर निघालो. पुणे-सोलापूर रस्त्याने जाउन आधी थेऊरच्या चिंतामणीचे
दर्शन घेतले आणी परत महामार्गाला जाउन यवतच्या २ किमी अलीकडे असलेल्या टोल
नाक्याच्या थोडेसे पुढे भुलेश्वर-सासवड फाट्यावरून उजवीकडे वळालो. इथून
साधारण ८ किमी असलेल्या भुलेश्वराच्या मंदीरापाशी घाट चढून पोहोचलो. भुलेश्वर
हे अतिशय सुंदर कोरीव काम असलेले १३ व्या शतकातील यादवकालीन शिल्पसमृद्ध
शिवमंदीर आहे. इस्लामिक आक्रमणात येथील बर्याच शिल्पांची पडझड झाली आहे.
तरी जे शिल्लक आहे ते निव्वळ अप्रतिमच. मंदिराचा बाह्यभाग इस्लामिक शैलीतला
वाटतो आणि अर्थात मूळ मंदिरावर नंतर तो इस्लामिक राजवटीत बांधल्याचे दिसते
ते नंतरची आक्रमणे रोखण्यासाठीच बहुधा. एका
अंधार्या वाटेने आपण मंदिराच्या अंतर्भागात प्रवेश करतो आणी शिल्पांचा
खजिनाच आपल्यासमोर उघड होतो. पुढे काय लिहू, प्रत्यक्ष बघाच.......
व शेवटी
टी
Bhuleshwar AKA Daulatmangal Fort
Unknown
4 minutes
Bhuleshwar AKA Daulatmangal Fort
Type: Hill fortsGrade: Easy (You can drive till top) Base Village: Off Urali Kanchan, beforeYevat Distance: 45 KMs from Pune Route: Pune-Solapur Road Time visited: Feb 2011 Time to see around: 1 hour max How to visit: From swargate hit Pune-Solapur highway. After the
toll road ends at Urali-Kanchan, (2 Kms before Yevat) take right turn
along eastern bank of canal. The fort should be around 8 Km. There is
small ghat but the road is good condition. This raod further goes down
to Saswad. There is right side diversion just as the Ghat ends and a
bumpy road with pretty steep with sharp turn’s lead you right till the
temple on the top of the fort.
Every time I visit Solapur I promise myself that I need to take
out time and visit Bhuleshwar temple on the Daulatmangal fort. This
Sunday finally I headed for this amazing place. Started at 6.45/7 we hit
the cool breezy road. The Sun was out smiling as the sleepy traffic
moved calmly at Magarpatta and Hadapsar.
After the toll ended we stopped at our favourite stop- Kanchan
for steamy breakfast. Mouth-watering Hot Idlis and Dosa on fresh green
leaf with yummy sambar recharged our energy that we would need for next
few hours. We strolled for few minutes in the Nishigand and Marigold
farms on the opposite side.
I could easily locate Bhuleshwar behind the hotel. After
turning on right the road from Solapur highway it become lonely amid
the dry arid landscape. A few leafy green of mostly Banana and Papai
farms are only ones that add beauty to the parched yellows and muddy
browns. Well just at the ghat starts, the large number of misty
Jacoranda tress adds the delightful voilets. Throughout this road, the
temple is always visible in front of you.
The striking Buruj towers at both ends draw you attention.
There are two connected towers probably now a home to a few people is at
the centre. Not sure if these were built recently...
There is good stairway built from half of the fort to the
temple but since the road is pretty steep with barely one vehicle could
pass safely I could locate a place to park my car. We finally reached
the top from the left side. I could locate 2 Buruj on the way. The fort
is supposed to be built around the temple in 16th century by Murar
Jagdev after he had looted Pune.
Bhuleswar Temple is very old and said to be built in 12th century
by Choula Rulers. The temple is centrally located on a huge platform.
The closer look of the roof towers highlights the magnificient artistic
detailed designs.
The Hemadpanthi temple is amazing built using Black besalt
rock. Somehow this temple gave me memories of Halebidu-Bellur temples.
The beautiful carving starts right from the door of the temple. A right
climb traverse in the dark lead you to a huge opening to the main
temple. A beautifully carved Nandi draws you attention. Every inch on
the main temple wall and every pillar has extremely fascinating and
wonderful intricate carvings with some having mythological references.
The temple bears many signs of invasion and destruction as you
can see typical destruction of all the artistic work- where hands and
heads are chopped off. It said that Aurangzeb had invaded this fort
before invasion of Jejuri.
The Hemadpanthi temple is amazing built using Black besalt rock. Somehow this temple gave me memories of Halebidu-Bellur temples. The beautiful carving starts right from the door of the temple. A right climb traverse in the dark lead you to a huge opening to the main temple. A beautifully carved Nandi draws you attention. Every inch on the main temple wall and every pillar has extremely fascinating and wonderful intricate carvings with some having mythological references.
The temple bears many signs of invasion and destruction as you can see typical destruction of all the artistic work- where hands and heads are chopped off. It said that Aurangzeb had invaded this fort before invasion of Jejuri.
With a promise to myself that I would visit back this mystic place once again in rains when the scorched yellows would turn into radiant greens, we proceeded to Ramdara.
या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरुवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.
मंदिराची रचना
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.
मंदिराची शैली
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिराचा गाभारा
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिरातील शिल्पे
या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. (युद्ध आणि परकीय आक्रमण) इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे.
भुलेश्वर – ना भुलेंगे कभी
Dec 18, 2019 ~ Dhaval Ramtirthkar
१५ डिसेंबर २०१९ (फिरस्ती महाराष्ट्राची बरोबर)
धवल रामतीर्थकर
IMG-20191214-WA0006
आदल्या दिवशीच शंतनूने हे तीन भुलेश्वर देऊळाचे नकाशे आमच्यात वाटून आम्हाला निराशेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला यादव काळात जेव्हा देऊळ बांधले गेले तेव्हा ते एवढेच होते.
IMG-20191214-WA0007
कालांतराने ते मोठे होत गेले व त्याच्या बाजूला बांधकाम वाढत गेले व चौथारा बांधला गेला
IMG-20191214-WA0008
शेवटी पेशवे काळात देवळाभोवती उंच भिंत बांधली गेली. कदाचित आमच्यासारख्या भुले-भटके जमातीच्या लोकांना गाफील ठेवण्यासाठी असावी
रस्त्यापासून भुलेश्वर देऊळापर्यंत थोड्या पायऱ्या लागतात. कडक ऊन पडायच्या आत आम्ही भग्न अवस्थेत असलेल्या द्वारातून आत शिरलो.
DSC01230
हा बुरुज त्या दौलतमंगल दुर्गाचा भाग आहे ज्यामध्ये भुलेश्वर देऊळ सुरक्षित उभे आहे. अर्थात आता फक्त तीन ढासळलेले बुरुज काय ते शिल्लक आहेत.
DSC01232
पायऱ्या चढताना वाटेत द्वाराला शोभेल असे भग्न अवस्थेतील दर्गा/मस्जिदचे अवशेष बाजूच्या डोंगराची शोभा ऐतिहासिक रीत्या वाढवत उभे होते
DSC01228
शंतनूने बसमध्ये असतानाच सर्वांना सावध केले होते, “आधी मला बऱ्याच शिव्या पडल्यात म्हणून तुम्हाला सांगतो की बाहेरून देऊळ बघितल्यावर त्याच्या साधारण रूप बघून निराश होऊ नका कारण मुख्य देऊळ त्या भिंतींच्या आत आहे.” पण मला तर बाहेरचा भागही आकर्षकच वाटला.
DSC01243
शंकराचे दर्शन घ्यायला येणारे भाविक भक्त एक एक करून पायऱ्या चढत होते
DSC01249
तिथेच आम्ही ठाण मांडून बसलो, कारण तिथेच शंतनूने देवळाचा इतिहास सांगण्यास सुरुवात केली आणि तेथूनपासून माझी आ केलेली मूर्ती कायम ऐकतच राहिली
DSC01237
देऊळ गाठायचा आधी डाव्या बाजूला हे द्वार लागते, ज्याला काही महत्व नाही. ना तिथे खोल्या आहेत ना पलीकडे कोणते महत्वाचे ठिकाण. पण ते होते देखणे
DSC01242
कोण म्हणते भूलेश्वर देऊळ बाहेरून साधारण आहे. हे पेशवेकालीन बांधकामही खूप काही सांगून जाते. जसे की याची रचना इस्लामिक वास्तूची आहे कारण इथे मिनार दिसतात.
DSC01246
हा पोट फाडणारा सुंदररीत्या कातरलेला नरसिंह बाहेरच आहे हं
DSC01244
ही एका मुसलमानांची आकृतीही हिंदू देवतांच्या खांद्याला खांदा लावून उभी दिसते.
DSC01247
नरसिंहाच्या बाजूलाच देवी आणि गणपती लपा छपी खेळताना दिसतात
DSC01248
हा तो सुंदर खांब ज्यात अनेक देवतांनी घर केले आहे
DSC01251
घंटा होती तर भली मोठी, आणि भला मोठा आवाज ही करत होती, पण ही पोर्तुगीज नाही
DSC01252
हे सुंदर सजवलेलं कासव देवळाच्या दरवाज्याबाहेर आपल्या पाठीवर आमच्यासारख्या अनेकांचे ओझे रोज वाहवत असणार
DSC01256
बाहेरची भिंत ओलांडून देवळाच्या आत शिरल्या शिरल्या अद्भुततेची पहिली झलक मिळते. उग्र डोळ्यांच्या अजस्त्र नंदीने आमचे स्वागत केले. असा मोठा नंदी मी हैदराबाद मध्ये असताना तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मध्ये बरेच पहिले आहेत पण महाराष्ट्रात प्रथमच पाहत होतो.
DSC01257
मुख्य देवळाच्या बाहेरची भिंत – महाभारतातील युद्धाची नांदी सुरुवातीलाच सुरु होते. पण हे माझ्या नजरेस पडले तेव्हा शंतनूची महाभारत वाणी सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता, त्यामुळे मला हे हरप्पन काळातील बैल गाडी असावी असे वाटले.
DSC01264
आतापर्यंत फिरस्ती महाराष्ट्राची जोडगोळी अनुराग आणि शंतनू यांच्या मुखातून सातवाहन, चालुक्य, यादवकालीन, पेशवेकालीन वगैरे या काळाची महिमा ऐकली होती. भुलेश्वर देवळात पहिल्यांदाच या काळाहून हजारो वर्षे मागचा इतिहास शंतनूने असा घडाघडा आमच्यासमोर जिवंत केला, अगदी जसा संजयने धृतराष्ट्राला LIVE टेलिकास्ट दिला होता. संजयचा विषय निघताच कोणीतरी अविश्वास प्रकट केला. बहुदा त्यांना कल्पना नसावी की साधू तरंगांच्या लहरींच्या आधारे हजारो मैल लांबचे बघू-ऐकू शकत होते. असो…
DSC01286
द्रौपदी स्वयंवराचे आम्ही पाहुणे – समोर सुरेख आकृत्या कोरलेल्या दिसत होत्या. शंतनूची ओघवती महाभारत वाणी प्रत्येक कोरलेल्या व्यक्तीचे ओळख करून देत होता, अर्जुन हातात धनुष्य बाण घेऊन वरच्या माशाचा वेध घेत उभा होता आणि आम्ही सर्व प्रेक्षक ते जगत होतो.
DSC01266
एका मुंगीचे महाभारत – मी या पुस्तकाविषयी ऐकले होते पण प्रथमच महाभारताच्या दगडात रचलेल्या पटाच्या अगदी बाजूला खऱ्या मुंग्यांचे हे प्रसादासाठीचे महाभारत चालूच होते
DSC01267
पाय काय आणि नाय काय – बघितले तर नुसतेच पाय. जरा वर बघितले तर नुसताच सुंदरीचा चेहेरा. मधला भाग खिलजीने निखाळलेला!
IMG-20191216-WA0106
सुरसुंदरी – देवळाच्या बाहेरच्या भिंतीवर पुढच्या व मागच्या बाजूला महाभारतातील काही मुख्य प्रसंग कोरले आहेत. दोन्ही बाजूंच्या भिंतींवर आहेत सुंदर सुंदर आकृत्या ज्यांना सुरसुंदरी म्हणतात. प्रत्येकीच्या हातात कोणते ना कोणते वाद्य आढळते म्हणून ‘सूर’ आणि अर्थात झाडून पुसून सर्व पुरातन देवळात स्त्रीचे रूपहे सुंदरच कोरलेले आढळते, म्हणून ‘सुंदरी’
DSC01269
या सुरसुंदरींच्या प्रतिभेपुढे नतमस्तक व्हावेच लागते
DSC01254
गजयुद्ध – महाभारतात माणसांना माणसे भिडली होती, योद्धांना योद्धा, महापुरुषांना महापुरुष, अमर आत्मांना अमर आत्मा आणि गजांना दुसरे तुल्यबळ गज
DSC01277
खरी गम्मत तर उभे असलेल्या फिरस्तीवाल्यांची डोक्याच्या वर आहे. आणि लवकरच आमच्या माना, नजरा व हृदये काही काळासाठी वरच्या दिशेला खिळून राहणार होते
DSC01272
कारण वरती होते असे महानुभव. गणपतीचे स्त्री रूप (अवतार नाही) वैनायकी. कधी पहिले आहे का?
DSC01275
फ्लॅशलाईट, फोकस वगैरे गोष्टी आज मॉडर्न म्हणतात, पण पुरातन काळापासून प्रकाशझोतात दर्शन देणारे आहेत हे भुलेश्वर देवळातही दिसले
DSC01296
भुलेश्वर गर्भगृह – बाहेर एवढे महाभारत नुकतेच ऐकून झाले होते, वैनायकी, सुरसुंदरी, गजयुद्ध, या सर्वांच्या सहवासातून शंकराचे दर्शन घ्यायला जाता तेव्हा हे सुंदर रेखाटलेल्या द्वाराबाहेर आपोआपच पाय खिळतात
DSC01297
आता हे कासव बघा ना, अगदी शी.ध. फडणीस यांच्या धम्माल रेखाचित्रातल्या लांबुडक्या कुत्र्यासारखे आडवे पसरलेले आहे. हो हो, हेच आहे भुलेश्वर देऊळ, एक से एक अजब कलाकुसरीने नटलेले, बाहेरून सामान्य पण आत शिरल्यावर अद्भुत
20191215_124705
माधुरी कृष्णा मॅडमच्या मोबाईल बॅटरी ने दिला धोका, धवलच्या मोबाईलने धडाधड फोटो कशा काढतायत बघा. त्यांचा फोटो काढण्याचा धडाका बघितला आणि मला राहवले नाही… क्लिक करते रहो मॅडम
IMG-20191216-WA0105
“हा तर लग्नमंडप”, दीपाली इखे मॅडमने इतक्या सहजपणे व सराईतपणे लग्नाच्या ज्या ज्या आकृत्या होत्या त्या शंतनू आधी ओळखून दाखवल्या
DSC01303
निघता निघता डोळे भरून बघावे म्हटलं तर देवळाने हे आपले सुंदर रूप सादर केले
DSC01304
घुमट नं. १ – असे वाटत होते की एक नाही तीन तीन भुलेश्वर देऊळे बघतोय. प्रत्येक घुमट लक्ष वेधणारा
DSC01305
घुमट नं २ – न रंगवलेली करामात
DSC01306
घुमट नं ३ – अच्छा परत भेटू, आज, उद्या, परवा, रोज. अर्रे एवढा सुंदर नजर डोळ्यासमोरून हटणार आहे का कधी
DSC01299
कामशिल्प – जाता जाता देवळाच्या एकदम बाहेरच्या भिंतीवर हे लावलेले दिसले. आता इतक्या वर चढून कोण ते बघणार आहे, ती खिडकी थोडीच आहे
79876451_2749760945080863_8331280670613569536_n
भुलेश्वर-सासवड सहलीमधला आमचा चमू
DSC01282
ही ख्रिस्ती लोकांच्या gargoyle सारखे दिसणारी आकृती चक्क भुलेश्वर देवळाच्या एका शिखरावर होती
DSC01307
जी मस्जिदीची उरली सुरली भिंत सकाळी अंधुकशी दिसत होती, तीच आता ठळक दिसली आणि त्याचबरोबर बहुदा MTDC ने उभारलेली विश्राम छत्री ही दिसली
DSC01309
अष्टकोनी – हा गडाचा तिसरा बुरुज. नाव भुलेश्वर असले म्हणून काय झाले, कभी भुलेंगे इसे?
DSC01300
‘तेरा मोह काला’ हे तर ऐकले होते, पण इथे तर या कुत्र्याचा एक डोळाच काळा होता, बहुत कोणत्या एका कुत्रीला डोळा मारला असावा
20191215_132412
कऱ्हेचा स्वाद हॉटेल – निळू फुले झोकात आम्हाला गुपित संदेश देत होते, ‘बाई – बाबा संध्याकाळी वाड्यावर या.’ आम्हाला त्या वेळी तरी समोर वाढलेल्या चमचमीत जेवणापुढे काही लक्षात नाही आले पण संध्याकाळी आम्ही गेलो नक्की वाड्यावर, पण पुरंदरे वाड्यावर
नारायणपूर – आता हे रंग बघा, कसे सुंदर दगडी देवळाला बेरंग करून टाकले आहे
20191215_145210
अनुराग – शंतनू लेणीची चढण चढण्यापूर्वी बडघे बंधूंच्या या संदेशाने लक्ष वेधले
20191215_150559
आजचे सरप्राइज – अनुराग-शंतनूने शोधून काढलेली नारायणपूर देऊळापासून अंदाजे २०० मीटर अंतरावर पोखर डोंगरावरची लेणी
DSC01320
घारापुरीच्या लेणीतले मुख्य आकर्षण असलेले तीन मुखी शंकर, हेच याही लेणीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आढळतो. पण दगड भुसभुशीत असल्या कारणाने कोरीव काम अर्धवट सोडून द्यावे लागले असा अंदाज शंतनू ने बांधला
DSC01329
डोंगरावर ही कोणती नवीन डान्स स्टेप शिकताय अकेरकरजी, बहुदा ही अनुराग-शंतनू लेणी स्टेप असावी
DSC01328
कोणाचा साल्सा चालू होता तर कोणी तिथेच दगडावर बसून विश्राम करत होते. एकूणच ते डोंगर उतरणे खालून बघणाऱ्याला तरी मजेशीर वाटत होते
DSC01326
तीन तिघाडा काम… नशीबाने असे काही झाले नाही आणि तिघींची झुक झुक गाडी व्यवस्थित तळावर पोहोचली
20191215_151728
भुलेश्वर-सासवड सहल जर एका चित्रात व्यक्त करायची झाली तर…
20191215_152113
गावागावात अशा शाळा दिसतात, पण यातला हा छोटासा ‘डिजिटल’ बदल भविष्य सांगून जातो
DSC01345
चांगवाटेश्वर देऊळ – लेण्यांचा उतार संपला आणि आम्ही पुढच्या आकर्षणावर पोहोचलो. पोहोचतास सर्वांना प्रसन्न वाटू लागले कारण बाजूनेच संथ पाण्याचा झरा वाहत होता. हे देऊळ खाजगी मालकीचे असल्यामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ व सुंदर होता व तो झरा ही ट्रस्ट नेच निर्माण केला असे कळाले
DSC01341
देऊळ शंकराचे, म्हणजे दगडाचे, म्हणजे सुंदरच
DSC01337
पायऱ्या चढल्या चढल्या उज्या बाजूच्या खांबावर बायका ताक घुसळत होत्या, एकदम वृंदावनची आठवण झाली
DSC01338
आणि लगेच डावीकडच्या खांबावर ते ताक पिऊन धष्टपुष्ट झालेले मल्ल कुस्ती खेळण्यात मग्न होते
DSC01336
लोकांना रंगाची एवढी आवड असते की बिचाऱ्या नंदीची शिंगे सुद्धा सोडत नाहीत. नशीब तेवढ्यावरच थांबले
DSC01349
चांगवटेश्वर देऊळ बघून निघालो ते थेट खुद्द सासवडला जाऊन टेकलो. चालता चालता अचानक उजव्या बाजूला हा आखाडा दिला, त्याचे गेट अर्धे उघडेच होते, जणू काही रस्त्यावरून जाणार्या लोकांना बोलावत होते, त्यांना कोठे माहीत कोण काडी पहिलवान जात आहे
DSC01351
आखाड्यावरून पुढे सटकल्यास लगेचच डाव्या बाजूला एका शेतात डुलणाऱ्या या सुंदर धवल नजाऱ्याने आमचे स्वागत केले.
DSC01353
थोडे पुढे जाताच एका पुलावरून आम्हाला हे विदारक दृश्य दिसले. या थोर पेशव्याची, अजिंक्य बाजीराव पेशवयांच्या वडिलांची समाधी आणि अशी घाण अवस्था! पण दाह थोडा शांत तेव्हा झाला जेव्हा कळले की या वेळी आलेल्या अतिवृष्टीमुळे गाळ साचून समाधीची अशी अवस्था झाली आहे. तरी…
DSC01356
बाळाजी विश्वनाथ पेशवे समाधी – पहिल्या प्रसिद्धीस आलेल्या पेशव्याच्या समाधीवर पोहोचतो तर बाहेर कुलूप. शंतनूला तेथला रखवालदार माहित होता म्हणून बरे
20191215_164438
बाळाजी पेशव्यांची मूर्ती इवलीशी पण रुबाबदार आहे
DSC01362
आजूबाजूची बाग तर सुंदर केली होती पण लगेच काळात होते की पावसानंतर कोणी याकडे ढुंकून पहिले नव्हते
DSC01363
हे अजस्त्र कॅक्टस त्या कठीण काळाची प्रचिती देत भिंतीला खेटून उभे होते
DSC01367
मराठ्यांच्या पेशवयांची वंशावळ. दहा-पंधरा मिनिटे आम्ही १०० वर्षे महाराष्ट्राला पारतंत्रापासून शाबूत ठेवणारी मंडळी बघत व शोधात होतो
DSC01357
आम्हाला या देवळात आराम करायला सोडून रखवालदार समाधीची किल्ली आणण्यासाठी गेला, आणि जीव दोन मिनिटांसाठी का होईना पण विसावले
DSC01358
ही जोडगोळी इथेही एकत्र, वाह!
DSC01360
अर्रे हे काय, जोडगोळीतली एक गोळी सुटून दुसरीकडे. बहुदा आधीच्या जागेतून अधिक आरामदायी बसकण मिळाले असावे 🙂
20191215_170329
लाईट्स – कॅमेरा- स्टॉप — या देऊळामागे चालू असलेले जोडप्याचे शूटिंग थांबवून आम्ही मनसोक्त फोटो टिपले
IMG-20191215-WA0006
शंतनूने भुलेश्वरचे ब्लूप्रिन्ट आदल्या दिवशी पाठवले होते. हे संगमेश्वर देऊळाचे जुने चित्र त्याने सकाळी सकाळी आमची बस भुलेश्वरच्या दिशेने जात असताना पाठवले.
DSC01352
अगदी चित्रातल्यासारखं नव्हतं पण लांबूनसुद्धा हे देऊळ सुंदर, आखीव रेखीव, मनाला भावणारे नक्कीच आहे. आम्ही ज्या पुलावर उभे राहून बालाजी पेशवयांची समाधी बघितली तेथूनच पलीकडे हे देऊळ दिसत होते.
DSC01373
फक्त देऊळ आणि आमच्यामध्ये होता पावसामुळे वाहत आलेला टन भर कचरा.
DSC01374
संगमेश्वर देवळाकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्या पूलाचीही पावसामुळे अवकळा झाली आहे. असं वाटत होते की या पूलानेच वाहत आलेल्या कचऱ्याला रोखले होते.
DSC01376
कलाकुसरीचा उत्तम नमुना म्हणून या देऊळाकडे बघितले जाऊ शकते. बाहेरून जेवढे सुंदर आहे तेवढेच आतून रंजक. लवकरच जाऊया आत
DSC01378
जसे शिखराच्या जवळ गेलो (अर्थात कॅमेऱ्या मार्फतच) तसे याची विपुल कला हृदयास भिडली
DSC01380
चला आत आलोय… आणि हे बघा हा अजस्त नंदी आणि बघितलं का २ नाग त्याच्या मानेवर विराजमान आहेत. जेवढे बघू तेवढे थोडेच!
DSC01381
उजव्या सोंडेचा गणपती मला माधुरी कृष्णा मॅडमने दाखवला. आणि गम्मत बघा, गणपती स्वतः सोंडेने प्रसाद खातो आहे. कदाचित आम्ही भक्तगण आलेलो त्याने बघितले नसावे.
DSC01382
संगमेश्वर देऊळाचे गर्भगृह
IMG-20191216-WA0130
संगमेश्वर नंतरचा थांबा होता या आधुनिक दिसणाऱ्या भैरवनाथ देऊळात. बाहेरचा देखावा बघून माझी आत जायची इच्छा नव्हती पण सगळे गेले म्हणून मी गेलो, हे केवढे बरे झाले
DSC01383
आत शिरताच वरती एक जुनी मोठी घंटा आहे. तिला बघताच तिच्यावर कोरलेले ‘DOMINIC’ ही अक्षरे लगेच दिसली आणि ही तर पोर्तुगीज घंटा याची खात्री पटली. अशा अनेक घंटा चिमाजी अप्पांनी वसईची लढाई जिंकून तिथल्या चर्च मधून विजयाचे प्रतीक म्हणून इथे महाराष्ट्रात आणल्या आणि जागोजागी आता त्या देऊळात भूषण म्हणून दिसतात
DSC01385
घंटेच्या पुढे, वरती, एक सुंदर झुंबर व काचेचे पुरातन दिवे लटकत आमच्याकडे टुकूटुकू बघत होते
20191215_173548
देऊळ बघून झाल्यावर आम्ही तिथेच दारात बसलो आणि शंतनूने आधी स्वतःहून वचन दिल्याप्रमाणे आम्हाला बालाजी पेशव्यांची कथा ऐकवू लागला. साहजिकच आम्ही सर्वजण त्या शांत वातावरणात ती आयती माहिती अगदी मन लावून ऐकत होतो
DSC01387
भैरवनाथ देऊळात असतानाच बाजूला उभी असलेली उत्तुंग संरक्षक भिंत नजरेत भरली. पण लगेच कळले की या वाड्यात जायची परवानगी नाही, कोणालाही आत सोडत नाहीत. असे ही आत आता काही उरले नाही. पण एवढी भव्य भिंत बघून आत काय राखून ठेवले असेल याची मनाला रुखरुख लंघून राहिलीच
DSC01391
आमची पावले आपोआपच त्या पुरंदरेंच्या वाड्याकडे वळली. बाहेरून तर हा चक्क किल्ला आहे, आर आतून कसा असेल. तेवढ्यात शंतनूचा आवाज आला, तो द्वारपालाशी विनवणी करत होता की आम्हाला ५ मिनिटे तरी आत जाऊ देत. तिथे कोणते तरी वेब सिरीयलचे शूटिंग चालू होते आणि ती मंडळी चहा पिण्यासाठी तेव्हाच बाहेर पडली आणि आम्ही संधी साधली.
DSC01393
त्या राकट दरवाज्याचे छोटे द्वार उघडले गेले आणि एक एक करून आम्ही पटापट आत शिरलो कारण आमच्याकडे होती फक्त ५ मिनिटे!
DSC01394
आत जाताच अंधारात वरती असंख वटवाघूळांची अस्वस्थता कानी पडली. पण आता त्याच्याकडे लक्ष देतंय कोण, आता वेध होते वाड्याचे. आणि आत जाताच काहीतरी ओळखीचे आहे असे वाटू लागले आणि तेवढ्यात शेखर ओरडला, “अर्रे हा तर ‘तुंबाड’ मधला वाडा.” तरीच इतका ओळखीचा वाटत होता, इथेच तर तुंबाड सिनेमाचे शूटिंग केले होते.
IMG-20191215-WA0012
IMG-20191215-WA0016
IMG-20191215-WA0013
IMG-20191215-WA0019
DSC01395
आत शिरलो तर पुरातन वाड्याचे अवशेच तेवढे उरले होते, पण तुंबाड मध्ये केवढे उठावदार दिसत होते .पण त्या निसटत्या सूर्यप्रकाशात या सगळ्या अवशेषांना गूढ स्वरूप आले होते.
IMG-20191215-WA0010
सगळीकडे रान माजले होते व वाड्याला गिळंकृत करायच्या प्रयत्नात होते
DSC01399
असं वाटले की १ सेकंद पण नाही झाला की शिट्टी ऐकू आली. ५ मिनटे संपली होती आणि आम्ही विजयी मुद्रेने माघारी फिरलो.
IMG-20191216-WA0148
फोटो: शंतनू परांजपे
79728753_2749760675080890_3593328940170608640_n
पुरंदरे वाडा मोहीम यशस्वी झाल्यावर फोटो तो बनता है…
तर मित्रहो हाच तो क्षण, हीच ती वेळ… या फोटो बरोबरच आमची सहल समाप्त.
या वेळी मी लिखाण चित्रांच्या माध्यमातून केले आहे. पण सर्व फोटो पाहता एक लक्षात आले की माझा कॅमेरा खराब झाला आहे. आदल्या दिवशीच तो माझ्या हातातून पडला होता आणि त्याचे परिणाम बऱ्याच फोटो मध्ये स्पष्ट दिसून येतात.
सांभाळून घ्यावे ही विनंती.
जाता जाता फिरस्ती महाराष्ट्राची ने आयोजित केलेल्या भुलेश्वर – सासवड सहली बद्दलचे माझे प्रामाणिक मत, ज्याने ग्रुपवर खळबळ उडवली होती…
भुलेश्वर एक अप्रतिम आविष्कार पण भूललेला ! पण तीथे गेल्यावर तो आजही आम्हास सर्व विश्व भुलावयास भाग पडतो असा त्याचा सुरेख सुंदर लोभस नजारा !!!
भुलेश्वर हे पुण्याजवळील(भुलेश्वर मुंबई चे नव्हे) प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या पांडवकालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण “मंगलगड” असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेस व यवतच्या नैऋत्येस ७०० फूट उंचीवर मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील शिल्पात कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. लढाईच्याकाळात बर्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभार्यातशिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. दर सोमवारी यात्रा भरते. ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे. शहाजीराजे यांच्या सुपे परगण्यातील हे ठिकाण असून राजामाता जिजाऊ बालशिवबाला घेऊन येत असत.सुरवातीला हा गड निजामाचा सरदार मुरारजोगदेव याच्याकड़े होता. पुणे जाळल्यावर प्रांताचा कारभार मामले दॅालत मंगळ भुलेश्रर येथून होत होता.
मंदिराची रचना
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात.पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपर्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरीत्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभार्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणार्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओवर्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवर्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवर्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा येथे जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
मंदिराच्या गाभार्याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्रनामांत या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत.
दौलतमंगल किल्ला –
१६३४मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला मांडला. (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो.
पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद ऐतिहासिक साधनांमध्ये आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. येथील जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे, शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहेत. पुरातत्त्वखात्याने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. मात्र भिंतीवर नाव लिहिण्याचा आमचा नादच खुळा कायम आहे हे पाहून खेद होतो.
म्हणून हे भुलेश्वरा आम्हाला केवळ सौंदर्यदृष्टी देऊ नकोस, तर सजीव-निर्जीव सर्वांचा आदर करण्याची बुद्धी नक्की दे !!!
-प्रा रवि आत्माराम बाविस्कर
।।फक्तइतिहास।।
https://faktitihas.wordpress.com/page/5/
भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
बरेच दिवस समाधी अवस्थेत असलेल्या ब्लॉगला आज काही प्रमाणात संजीवनी मिळेल असे वाटत आहे. मनात साचलेले खूप आहे पण खरडायला काही वेळ मिळत नाही. नवीन नोकरी आणि कांदे-पोहे कार्यक्रम या दोन्ही गोष्टी अश्या काही मानगुटीवर बसल्यात की गुडघे पार दुखून जातात. ( यातले कोणाला किती कळले माहित नाही,मला काहीच कळले नाही असो. )
इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.
तर आमचा प्लान होता पुणे-> यवत-> भुलेश्वर->माळशिरस-> पांडेश्वर-> सासवड->पुणे. आणी ते पण बाईक वर. "माझ्या बाईकची दोन्ही चाके फिरतात आणी ब्रेक लावला की थांबतात." असा एका वाक्यात तिच्यावर निबंध होऊ शकेल. असो.
यवत पासून उजवीकडे एक फाटा फुटतो. रस्त्यावरच भुलेश्वर मंदीर अशी पाटी लावलेली दिसते. पुण्यापासून यवत ५५ किमी आणि तेथून बोपदेव घाटातून भुलेश्वर १५ किमी.बोपदेव घाट संपला की लगेच एक फाटा फुटतो तेथून उजवीकडे भुलेश्वर मंदीर.
बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता)
मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा ढग भरून आलेच होते. मस्त हिरवागार,निर्जन परिसर, हलकासा पाऊस. मजा आली. हलकाश्या पाऊसात निवांत गाडी चालवत गप्पा टप्पा करत चाललो होतो. एखाद दुसरी दुधाची गाडी ये जा करत होती.
एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.
येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.
बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.
प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प.
या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.
ऐरावातावळ
प्रत्येक शिवमंदिरात प्रवेशद्वाराशी कासव का असते याचा अभ्यास करायला हवा. मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पण सोमेश्वर मंदिरात असेच कासव होते.
मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.
महानंदी
मुख्य मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते महानंदीचे. मंदिराच्या मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. प्रत्येक अन प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक डिटेल काम पाहून डोके चक्रावून जाते.
भुलेश्वर बरेच दिवस मनांत होतं पण होत नव्हतं शेवटी जुलॅ महिन्यात एका रविवारी जमवलंच. मी,अश्विनी,आई व ह्रुषीकेश होके मिंटी मँ सवार, निघालो. वारजे ते यवत साधारण १ तास लागतो.
यवतच्या अलीकडे - पूण्याकडुन सोलापुर कडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने रस्ता आत जातो, तोच रस्ता भुलेश्वरकडे जातो. एकदा उजवीकडे वळलं की सतत एक टेलिफोन टॉवर दिसत राहतो. तोच आपल्याला गाठायचा असतो हे लक्षात ठेवा. खबरदारी या गोष्टीची घ्यावी लागते की, शेवटचा घाट हा फार अवघड आहे, फक्त एक म्हणजे एकच चार चाकी जाउ शकते.
आता मंदिरा बद्दल - हे एका टेकडीवर असलेल्या पठारावर आहे. बाहेरुन मंदिर मोठ्या वाड्यासारखे दिसते. उन्हातुन आत गेलात तर वाटेल की समोर मुर्ती पण नाही आणि सग़ळा अंधार आहे. या अंधाराला थोडे डोळे सरावले की डाव्या बाजुला पहा एक दिड फुटी या मापाच्या ४ पाय-या आहेत.
त्या चढुन वर गेलात की मग आधी लक्ष जातं ते या नंदीकडे. अतिशय रेखीव्,प्रमाणबद्ध खुप मोठा आहे.
आता डोळे या पुढच्या मंदिरच्या भव्यतेच्या तयारीत असतांत्,आणि ती अशी आहे. मी फार लिहित नाही या छायाचित्रांनाच बोलु देत.
हे नक्षीदार खांब
हे छत तोलुन धरणारे गंधर्व (बहुधा, जाणकारांनी खुलासा करावा)
ही पिंड, ह्या पिंडीच्या खाली पुन्हा पिंडी आहेत, तसेच या पिंडीला असणा-या छिद्रातुन भुंगे बाहेर येउन त्यांनी यवन सॅन्याला पळबुन लावल्याच्या कथा हे पुजारी सांगतीलच.
आणि हे मंदिरातल्या नक्षीकामाचे असंख्य नमुन्यांपॅकी काही..
ही स्त्री गणेशाची प्रतिमा आहे, आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिली.
आणि ही बहुधा स्त्री कार्तिकेयाची (जाणकारांनी खुलासा करावा)
संपुर्ण मंदिराची, म्हणजे गर्भग्रुहाची बाहेरची भिंत अशा नर्तकींच्या मुर्तींनी नटवलेली आहे.
हे शिल्प गंगावतर्णासारखं वाटलं मला (पुन्हा तेच जा.खु.क.)
या जाळ्या अखंड दगडात कोरलेल्या आहेत.
सुरुवातीला भेटलेल्या नंदीचे जवळुन घेतलेले छायाचित्र
काही खांबावर अशा नर्तकी आहेत.
मंदिरात काही मॅथुन शिल्पं ही असावीत्,त्यातली काही पुन्हा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हे मुळ मंदिर संपुर्ण दगडी आहे, तर बाहेर्च्या बाजुला पेशव्यांनी या मंदिराचा मातीच्या बांधकामांत जिर्णोद्धार केलेला आहे.
पाउस पडायला सुरुवात झाल्यानं त्याची छायाचित्रे काढता आली नाहीत.
आपणां सर्वांना नम्र विनंती आहे की, पुण्यात असाल तर ३-४ महिन्यांत एकदा आणि नाहीतर जंव्हा याल तेंव्हा भुलेश्वरला जरुर भेट द्या.
पहिल्या भागाच्या प्रतिसादासाठी अतिशय धन्यवाद. काही फोटो राहले होते, ते तेंव्हा फार महत्वाचे वाटले नाहीत म्हणुन ते टाकले नव्हते, ते आता टाकत आहे. सर्वांना आवड्तील अशी अपेक्षा आहे.
हेमाड्पंती बांधकामाचा पुरावा या खांबांचा जोड पाहा,त्यात कोठेही काही भरलेले नाही.
या देवळांतच गर्भग्रुहाच्या बाजुला अश्या खोल्या आहेत, ज्या मध्ये विविध देवांची स्वतंत्र मंदिरे होती.
या आहेत,मंदिरात आत गेल्या गेल्या उजवीकडे असणा-या पाय-या,जे काही आहे ते या पाय-यांच्या वर आहे.
मंदिरात आत गेल्या गेल्या जी ओसरी आहे हे तिचं छत.
आणि हे एक आश्चर्यच होतं निदान माझ्यासाठी तरी,शंकराच्या मंदिरात चक्क शेषशायी विष्णुची प्रतिमा आणि मंदिर. हे जर चांगल्या अवस्थेत असतं ना तर...
त्याच वरच्या मंदिराचा जबळुन घेतलेला फोटो.
आता भुलेश्वरला जाणा-यांची संख्या वाढेल असं वाटतंय
हर्षद
दौलतमंगळ किल्ला आज शेवटच्या घटका मोजतोय.पडझडीने जीर्णशीर्ण झालेल्या या किल्ल्याचं संवर्धन होणं अत्यंत गरजेचं आहे. पर्यटक म्हणून जाणा-या ट्रेकर्सना या किल्ल्याची अवस्था पाहून खूप वाईट वाटतं. अशा सर्व किल्ल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे.
daulatmangal1
गड-कोटांचे संवर्धन हा केवळ सामाजिक प्रश्न नसून तो जिव्हाळयाचाही बनला आहे. महाराष्ट्रातले नेमके गड-कोट किती? यापेक्षा त्यातले सुस्थितीत किती..? हे प्रश्न आपल्या स्वाभिमानी मनाला जास्त टोचतात. याला कारणच तसं आहे म्हणा! महाराष्ट्राच्या मातीला या गड-कोटांवरच्या इतिहासाचा नेहमीच अभिमान वाटत आलाय. परंतु आपल्या सर्वाच्या नाकत्रेपणामुळेच आणि दुर्लक्षितपणामुळेच एकेकाळी वैभवात नांदणारे गड-किल्ले आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत.
एकेकाळी मराठी सत्तेचा कारभार पाहणारे बहुतांशी किल्ले तर अगदी शेवटची घटका मोजत आहेत. यापैकी काही तर नामशेष झालेसुद्धा..! अस्तित्व संपलेल्या या किल्ल्यांना अक्षरश: कागदातूनच शोधावे लागणार आहे यात शंका नाही. असाच एक इतिहासकालीन पुण्याजवळील किल्ला पूर्णत: नामशेष झाला असून हा किल्ला आता केवळ डोंगर म्हणनूच उभा आहे. दौलतमंगळ असं याचं देखणं नाव!
हा दौलतमंगळ अक्षरश: शेवटची घटका मोजत कसाबसा उभा आहे. या किल्ल्याच्या बाबतीत समाधानाची एकच गोष्ट म्हणजे या किल्ल्यात असलेलं एक प्राचीन आणि तितकंच सुंदर शिवमंदिर अजूनही तग धरून आहे. म्हणूनच या डोंगरावर अनेक शिवभक्त शंकराच्या पिंडीच्या दर्शनासाठी येत असतात, पण बहुतेकांना येथेच एक किल्ला होता असे म्हटले तरी पटणार नाही, इतकं भीषण वास्तव या किल्ल्याच्या बाबतीत इथं घडलंय.
ब-याचदा फिरायला जायचे कोठे, त्याचे अंतर किती अशा प्रश्नांचा गुंता सोडवता-सोडवता आपले भटकणे राहून जाते. आणि काहीच नाही यापेक्षा काहीतरी-कोठेतरी फिरूच म्हणून गजबजलेली ठिकाणे पाहिली जातात. म्हणूनच आपल्या इतिहासाचा जर अभ्यास आणि वाचन केले तर काही सुंदर नावे नक्कीच आपल्या समोर येतील. दौलतमंगळचा डोंगर हे याच पंक्तीत भर घालणारं नाव आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतच्या अलीकडे उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. हा फाटा थेट माळशिरस नावाच्या गावात जातो. या गावात आलो की, एक डोंगर आपल्यासमोर ठाण मांडून उभा असतो. हा डोंगर जसजसा जवळ करू लागतो, तसतसं या डोंगराचा पडदा बाजूला होऊ लागतो. समोर येणारे बुरूज, दर्गा, तटबंदीचे अवशेष, पायरीमार्ग हे समोर येऊ लागतात. अन् मग आपल्या लक्षात येऊ लागते की, येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता. खरंच आहे हे. हा डोंगर म्हणजेच पूर्वीचा दौलतमंगळ किल्ला! विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी सन १६३४ मध्ये बांधल्याची नोंद मिळते. हा गड इतिहासात काही प्रसिद्ध पावला नाही किंवा यावर काही घडामोडीही घडल्या नाहीत. पण हा किल्ला आपल्या उदासीनतेचं आणि दुर्लक्षतेचं एक गंभीर उदाहरण आहे. कारण हा किल्ला आता पूर्णपणे नामशेष झाला आहे. याची खंत कोणालाच नाही. असो, याचे अवशेष पार करत आपण डोंगरावर आलो की मग भुलेश्वरचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर घेऊन उभं असल्यासारखं वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसंजसं जवळ येऊ तसंतसं अधिकच खुलतंय असं वाटू लागतं.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच द्वारपाल जय-विजय, पायऱ्यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते. शिखरावरील चुन्याच्या बांधकामावर गणेश, विष्णू आदी देवतांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो.
या मंदिरात प्रवेश करताक्षणीच लाजवाब, भारी, खूपच सुंदर..असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते. मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभुषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल. नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची सुरेख िपडी आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाह्य भिंतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट कोरलेला दिसून येतो. या शिल्पकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे पाहू आणि किती पाहू यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं स्त्रीरूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते तर समाधान, विरंगुळा, ऊर्जा, मनाला छेडणारी तार..हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या सौंदर्यतेच्या मापदंडांचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसूकच या सौंदर्यतुषारात भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात भुलवून सोडणारं हे भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा.
किल्ल्याची ऊंची : 2000
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले आहे. हे मंदिर असलेल्या टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन शहाजीराजांच्या काळात दौलतमंगळ किल्लाची उभारणी करण्यात आली. किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या मंगळाई देवीच्या ठाण्यावरुन या किल्ल्याला “दौलतमंगळ गड” हे नाव पडले असावे.
पुण्याहुन स्वत:च्या वाहनाने एका दिवसात जेजुरी आणि दौलतमंगळ गड उर्फ भुलेश्वर ही दोनही ठिकाणे पाहता येतात.
इतिहास :
पौराणिक आख्यायीके नुसार पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच नृत्य केले होते. येथेच त्यांचा विवाह होउन येथुनच ते कैलास पर्वतावर गेले होते. त्याठिकाणी भुलेश्वर मंदिर मंदिराची उभारणी १२ व्या शतकात यादवांनी केली.
१६ व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या तीन पुत्रांची निजामाने भर दरबारात हत्या केल्यावर शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर कुठल्या बादशाहाच्या पदरी राहाण्यापेक्षा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुणे ही शहाजी राजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागिरदारी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजुबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फ़ौज घेऊन पुण्यावर पाठवले. युध्दाच्या या धामधुमीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना शहाजी राजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठवले. रायरावने पुण्यावर हल्ला करुन पुणे उध्वस्त केले. त्यावरुन गाढवाचा नांगर फ़िरवला.
मुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फ़ौजांनी पुण्याची वाताहात केल्यावर मुरार जगदेवांनी १६२९ मधे पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडी भोवती तटबंदी, बुरुज बांधुन दौलतमंगळ किल्लाची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलत मंगळ किल्ल्यावरुन पाहिला जात होता. मुरार जगदेवांची १६३५ मधे आदिलशहाने हत्या केली. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करुन लालमहालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगळ किल्ल्याचे महत्व कमी झाले.
पहाण्याची ठिकाणे :
पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून १० किलोमीटर अंतरावर दौलतमंगळ गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यावर जातो त्यामुळे चुकण्याची अजिबात शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशव्दाराच्या आधी २ बुरुज पाहायला मिळतात. तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कालौघात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशव्दाराच्या अलिकडे एक पायवाट असून तेथुन १५ मिनिटे चालत गेल्यास थेट भुलेश्वर मंदिरात पोहचता येते. पायवाटेच्या उजव्या बाजूला एक पडझड झालेली एक कमान आढळते. वाहनाने गेल्यास वाहने मंदिराच्या मागच्या बाजूला पार्क करून ५ मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात प्रवेश होतो. पायऱ्या चढताना उजव्या तसेच डाव्या बाजूला मूर्तीशिल्प आढळतात. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा, तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच एक भिंत आहे तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तिथून मंदिरात प्रवेश होतो यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते. तसेच मंदिरात अंधार जाणवतो. डावीकडील पायर्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य साधरणपणे ६ फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरी नक्षी काम, विविध शिल्प, कोरीव मुर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतींवर कोरलेल्या मुर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेवून मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेवून त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथूनच मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे. त्याबाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी वास्तू ( कोठार) आहे. समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे. त्याच दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास एक तास लागतो. मंदिरा जवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते.
पोहोचण्याच्या वाटा :
स्वत:च्या वाहनाने पुणे सोलापूर महामार्गा वरून ( पुणे – हडपसर- उरळी कांचन ) साधारणपणे ४५ किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलिस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजुच्या पाटाच्या रस्त्याने दौलतमंगळ गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात घाटमार्गाने पोहोचता येते. यवत गावापासून भुलेश्वर मंदिर १० किलोमीटर अंतरावर आहे.
राहाण्याची सोय: गडाचा,मंदिराचा परिसर मोठा असून राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय: गडावर जेवण्याची सोय नाही. दर रविवारी भुलेश्वर मंदिरात प्रसाद असतो.
पाण्याची सोय: पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: यवत गावातून चालत जाण्यासाठी साधारणपणे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो.
साभार: ट्रेक क्षितीज संस्था
मंदिराच्या काही अंतरावर एक ढासळलेल्या बुरुजावरून घेतलेले मंदिराचे हे सुरेख छायाचित्र!
भुलेश्वर मंदिर आणि परिसर हा खरंतर दौलतमंगळ नावाचा किल्ला होता. किल्ल्याचे काही भग्न अवशेष जसे बुरुज, प्रवेशद्वार अशा काही खुणा आजही किल्ल्याची साक्ष आहेत....
किल्ल्याचे हेच ते प्रवेशद्वार...
दारातून प्रवेश केला की काही पावलांवर किल्ल्याचा बेसाल्ट दगडात उभारलेला मुख्य दरवाजा दिसला...
अजून काही पायऱ्या चढल्यावर दिसला तो मंदिराचा सुंदर परिसर..
मंदिराच्या प्रांगणाच्या आरंभाला स्वागत करतात ते द्वारपाल..
आणि ह्स्तीशिल्प...........
मंदिराच्या प्रांगणात एकीकडे आहे चतुष्की. हीचा उपयोग यज्ञ किंवा दीक्षा देण्यासाठी होत असावा.
तर मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोर आहे ही भलीमोठी घंटा...
हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार...अतिशय साधे ...वाकून जावे इतके छोटे....
मंदिराच्या छतावर आहे हे सुंदर नक्षीकाम...
दरवाज्याकडे तोंड करून आहे हे कासवाची प्रतिमा...कासवासारख्या धीम्या शारीरिक आणि मानसिक गतीने मंदिरात प्रवेश करावा असेच जणू सांगण्यासाठी .
दरवाजाच्या पायरीजवळ आहे चतु:शीला...त्यावर दोन्ही बाजूला कोरले आहेत दोन कीर्तिमुख...
किंचित झुकत दरवाज्यातून आत गेल्यावर लागते दोन्ही बाजूला सुरेख नक्षी असलेले किंचित बसके अजून एक द्वार......ह्या द्वारावर पाच पट्ट्या कोरलेल्या आहेत...
डावीकडून त्यांची नावे आहेत, व्यालशाखा, पत्रशाखा, स्तंभशाखा, नर अथवा मानवशाखा आणि पुन्हा पत्रशाखा...
आणि द्वारावर आहे ललाटबिंब...
दरवाज्यातून समोरच दर्शन देते ती हनुमान प्रतिमा...
उजवीकडून काही दगडी पायऱ्या चढून गेल्यावर दिसते ते चकित करणारे मंदिराच्या सभामंडपातील शिल्पवैभव! हो वैभवच ते...नक्षीदार असंख्य स्तंभांनी आणि शिल्पांनी नटलेले आणि मढलेले सभामंडप........
हे शिल्पवैभव मोहून टाकणे, मतीगुंग करणारे ....ह्या मोहजलातून बाहेर आले हे भुलेश्वर अर्थात शिवाचे दर्शन घेण्यासाठी.....
दर्शन घेऊन निघताना नजर खिळवून राहिली ती सभामंडपातील अत्यंत सुरेख, सुबक, आकर्षक, अवाढव्य नंदिशिल्पाकडे!
सूर्यकिरणांचा अभिषेक थेट शिवपिंडीवर व्हावा म्हणून नंदीने आपले मुख किंचित वळवले ! कथा हे सांगते. पण त्यामागचा भावार्थ आपण घेऊ तसा..शिवपिंड आणि रविकिरण यांच्या मधे येणारा मी कोण? किती ही उदात्त भावना....
.
सभामंडपात एका विलक्षण प्रतिमेने लक्ष वेधून घेतले....भव्य कासव प्रतिमा...
हे कासव इथे कसे आले? की आधीच इथे होते? ह्या पेक्षाही मला भावले तो त्याची मन लुभावणारी प्रतिमा....अतिभव्य, सुरेख, सुबक आणि सुरचित.....कासवासारखे नतमस्तक, शरणागत होत, अध्यात्मिक उन्नती हा एकच भावार्थ मनी ठेवत शिवाचे दर्शन घ्यावे असेच तर नाही ना संदेश देत हे कासव?
आता सुरु झाला नजरभेट ते ज्ञानभेट हा प्रवास.....एक एक शिल्प बारकाईने पाहून त्यामागची त्याची कथा भावार्थ समजून-उमजून घेण्याचा प्रवास...
रामायणातील श्रीराम-भरत मिलाप दृश्य साकारणारे हे सुरेख शिल्प...
श्रीराम वानरसेना घेऊन परतत आहेत (डावीकडून..)
हत्ती घेऊन भेटीला येत आहे अत्यंत प्रिय बंधू भरत...
रामायणातील सुप्रसिद्ध मारिचवधाचा प्रसंग सभामंडपात कोरला आहे..
महाभारतातील युध्दासहित काही प्रसंग इथे कोरलेले आहेत. त्यापैकी एक द्रौपदीस्वयंवराचा शिल्पपट असाच मनमोहक..
रथावर आरूढ कृष्ण आणि अर्जुन..
पितामह भीष्म मृत्यूशय्येवर असताना त्यांना भेट देणारे पांडव....
द्रूष्टदुन्म्य आणि पांडव कथा
घटोत्कच युद्ध..
सभामंडपात एका ठिकाणी उंचावर समुद्रमंथन प्रसंग शिल्पपट आहे..समुद्रमंथन एक सुप्रसिद्ध पौराणिक कथा आहे. देव आणि दानवांनी मिळून हे समुद्रमंथन केले होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्राचे वैभव समुद्रात मिळाले. समुद्रात पडलेले वैभव परत मिळवण्यासाठी विष्णूने इंद्राला समुद्रमंथनाचा उपाय सुचवला. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी करून आणि वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन करावे. त्यातून अमृतप्राप्ती होईल . वैभव पुन्हा प्राप्त होईल. अशी ही थोडक्यात कथा असणारे हे शिल्प!
सभामंडपात अगणित देवकोष्ठ आहेत. मुख्य मंदिराच्या बाह्य भागावर सूरसुंदरीची विविध शिल्प कोरलेली आहेत. मूर्तीभंजकांनी ह्या शिल्पांची तोडफोड केली असली तरी शिल्पकारांनी किती कल्पकतेने शिल्पांमध्ये सौंदर्य भरले आहे ह्याची कल्पना शिल्प पाहताना येते.
हातात मृदुंग घेतलेली ही सुंदरी. हीच नाव आहे मर्दला!
प्रेतावर उभी चामुंडा..सप्तमातृका पैकी एका शैवशक्ती चे एक संहारक, रौद्र रूप. पौराणिक कथे नुसार काली अवतारात असताना या शक्ती देवतेने चंड आणि मुंड या दोन शक्तीशाली असुरी वृत्तीच्या राक्षसांना ठार मारले. त्यामुळे हिला चामुंडा हे नाव मिळाले. या देवतेचे वाहन प्रेत असते. पुण्याजवळील भुलेश्वर मंदिरात प्रेतावर उभ्या देवी चामुंडाचे शिल्प आहे. मुर्तिभांजकांनी हात - पाय तोडले असले तरी देवी चामुंडा चे हे अद्भुत शिल्प शिल्पकारांनी इथे कोरले आहे.
महिषासूरमर्दिनी..
मर्कट आणि सुंदरी..
नाग धारण केलेली वनिता..
दर्पणसुंदरी..सौंदर्य आरशात न्याहाळण्या सोबतच शिल्पाचा भावार्थ आहे, मंदिरात जाण्याआधी स्व-अवलोकन, आत्म-मंथन, आत्म-विश्लेषण करा. आपल्या भावना, विचार यांचा मागोवा घेत पवित्र मन सौंदर्याने मंदिरात प्रवेश करा.
सप्तमातृकामधील ऐरावतावर आरूढ इंद्राणी..
सप्तमातृकामधील..डावीकडील विनायकी, बैलावर/वृषभावर आरूढ माहेश्वरी आणि मोरावर आरूढ कौमारी....
सप्तमातृका ह्या देवतांच्या शक्ती मानल्या जातात. मातृका ह्या पुरुष देवतांच्या शक्ती असल्यामुळे त्या मूर्ती स्त्री रुपात घडवल्या गेल्या. ब्रम्हाची ब्राम्ही/ब्रम्हाणी, इंद्राची इंद्राणी.एन्द्री, महेशाची माहेश्वरी, कार्तिकेयाची कौमारी, विष्णूची वैष्णवी, वराहाची वाराही, यमाची चामुंडा ह्या त्या सप्तमातृका! हातात आयुधे आणि हस्तमुद्रा या रुपात त्या आढळतात.
योगिनी, वैनायकी यांचे संदर्भ पुराणात आढळतात.
वैनायकी ही विनायकाची स्त्री रुपी प्रतिमा..
वैनायकी ला गणेशानी, लंबोदरी, विघ्नेश्वरी, स्त्री-गणेश असे देखील म्हणतात. गजवदना वैनायकीच्या आसनासमोर मूषक आहे. हातात दंड, अंकुश आणि मोदकपात्र आहे. डावीकडे वळलेली सोंड असून तोंडात हस्तीदंत आहेत. गळ्यात हार, हातात कंकणे आणि पायात नुपूर आहेत.
खालील शिल्पपटात गरुडावर आरूढ वैष्णवी (उजवीकडील) दिसत आहे...
ह्या असंख्य शिल्पाप्रमाणेच उलटे नाग असलेली यादवकालीन बांधकाम रचना येथे आहे.
खांबावर उलटे नाग आणि हत्ती आहे..
गरुडधारी संभाव्य भुयारी मंडपातील आतील भींतीवर शेषशायी विष्णूशिल्प आहे.
मंदिराच्या पूर्णपणे बाहेरील भिंतीवर दोन कां शिल्प आहेत..
मंदिराच्या बाहेर चक्कर मारली तर ढवळगड, पुरंदर, मल्हारगड किल्ले इथून दिसतात.
मंदिर बाहेरून बघितले तर आतल्या शिल्पवैभवाची सुतराम कल्पना येणार नाही असे हे भुलेश्वर मंदिर! मंदिराची सफर करताना नजरभेट चे रुपांतर ज्ञानभेटीत तर झालेच परंतु सतत शिल्पवैभवा पाठील हात स्मरणात येत राहिले. एक हात ज्यांनी शिल्पांची तोडफोड केली आणि एक हात ज्यांनी ह शिल्पे घडवली!
सलाम त्या शिल्पकारांना ज्यांच्या सिद्धहस्त चमत्कारातून ही भुरळ पडणारी शिल्पवैभव निर्मिती झाली!
भुलेश्वर
---------------
देवगिरीकर यादव यांच्या काळात महाराष्ट्रात अनेक हेमाडपंथी मंदिरे निर्माण करण्यात आली, त्यातीलच भुलेश्वर हे एक यादवकालीन शिल्पवैभवाचा देखणा नमुना असलेले शिवमंदिर. पुरंदर तालुक्याच्या क-हापठावर सह्याद्रीच्या दोन पर्वतरांगा एकमेकाला संमातर अशा पुवर्व पश्चिम पसरलेल्या आहेत. उत्तर दिशेच्या पर्वतरांगेवरील पुर्वेच्या टोकाला दौलतमंगळ किल्ला दिमाखात उभा आहे. याच किल्ल्यावर भुलेश्वर मंदिर आहे. पुरंदर तालुक्याचे शेवटचे टोक माळशिरस गाव असून, भुलेश्वरचे प्राचीन दिमाखदार वैभव पिढ्या न पिढ्या गावाने साभांळले. प्रत्येक माणसाच्या मनात या मंदिराची शिल्पकला आणि शंभुमहादेवाच्या प्रति मनात श्रद्धा आहे.
तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले आहे. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेवर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. गजनीच्या महंमदाने केलेल्या आक्रमणावेळी बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा-यात शिवलिंग आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते. माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते. महिनाभर यात्रा असते. परिसरातून मानाच्या कावडी येतात. चैत्री बारशीलाही मंदिरासमोर मानाच्या कावडी नाचवल्या जातात. ही जुनी परंरपरा आहे. या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. पत्रकार कवी दशरथ यादव यांनी संशोधन करुन यादवकालीन भुलेश्वर हे पु्स्तक लिहिले आहे.महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही आहे.
अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. गर्भगृहाच्या बाह्यभिंतीवर पाच देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्यभिंतीवर दोन देवकोष्ठे आहेत. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्ये कोरलेली आहेत. मंदिराच्या आवाराभोवती असलेल्या भिंतीला सोळा देवकुलिका आहेत.
या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्यासदृश आहे. इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्राकाराची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादवकाळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातील असून सभोवतालची भिंत, नगारखाना व शिखरे १८ व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्राकार होता. नंदीचा मंडप स्वतंत्र होता. १८ व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले. तुकोजी होळकर यांच्या काळात पुढील नगारखान्याचे बांधकाम झाले.
मंदिराची रचना -मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपांच्या भोवती असलेल्या अर्ध भिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण-महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातील प्रसंग इतर मंदिरापेक्षा जास्त ठसठशीत व रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते.
कुंभ, कमळ कीर्तिमुख, मकर, पाने-फळे, वेलबुट्ट्या ही शुभचिन्हे मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत. येथील दर्पणधारी स्त्रीमूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे. दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत-शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस दोन चौघडावाले उंट दाखवलेले आहेत. दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरीत्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची, शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्यापि टिकून आहे.
दौलत मंगळगड- १६३४ मध्ये विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने या डोंगरावर ‘दौलत मंगळ’ नावाचा किल्ला बांधला, (शिवचरित्र प्रदीप – १९२५) या किल्ल्याचा भग्न बुरूज अद्यापही देवळाकडे जाताना उजव्या बाजूस दृष्टीस पडतो. पहिले बाजीराव पेशवे व सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंथी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७ मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. हे बांधकाम संभाजी व व्यंकोजी नाईक या गवंड्यांनी केले. देवळाच्या बांधकामात स्वामी जातीने लक्ष पुरवित असत. दमाजी गायकवाड या सरदाराने पवारांवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ जीर्णोद्धारास पंचवीस हजार रुपये दिले. वसईच्या विजयानंतर चिमाजी अप्पांनी भुलेश्वरास मुकुटाकरिता १२५ रुपये व सव्वाशे सोन्याच्या पुतळ्या अर्पण केल्याची नोंद आहे. ब्रह्मेंद्रस्वामींनी माळशिरस व यवतमध्ये विहिरी व तळी बांधून दिली. जीर्णोद्धारामुळे मंदिर हेमाडपंथी-मराठा समिश्र वास्तुशैलीचे झालेले आहे.
या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे. नंदीच्या उजव्या बाजूस एक ओटा असून त्यावर कासवावर बसलेला नंदी असावा. हल्ली त्याचे फक्त डोके शिल्लक असल्यामुळे हा प्राणी निश्चित कोणता असावा हे कळत नाही. गर्भगृहातील शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. बाण काढल्यानंतर खाली आत तीन मुख्य लिंगे, तीन कोपऱ्यात उंचवट्याच्या स्वरूपात असून ती ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके आहेत. पिंडीच्या खाली असलेल्या खोलगट भागात नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असते. अन्य शिवमंदिरापेक्षा येथे अनेक वैशिष्ट्ये आढळतात. कीर्तिमुखे, उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचे चित्र असले तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. ओव-या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.
मंदिराच्या गाभा-याच्या बाहेरील बाजूस वर तीन सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीस्वरूपातले दुर्मीळ शिल्प आहे. वेरूळच्या कैलास लेण्यात या प्रकारचे शिल्प आढळते. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘वैनायकी’ असा केलेला आढळतो. देवीसहस्स्रनामात या देवतेस ‘विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी’ अशा विशेषणांनी संबोधले आहे. ‘शिल्परत्न’ या ग्रंथात वैनायकीचा उल्लेख ‘शक्तिगणपती’ असा केलेला आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात वैनायकी पूजनाचे महत्त्व वाढले. वैनायकी शिल्पे गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधे धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्पे पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टिका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पे आहेत. भुलेश्वर मंदिर हे पुरातत्वखात्याने ताब्यात घेतले असून राष्ट्रीय संरक्षक म्हणून जाहीर केले आहे. पुण्यापासून पन्नास किमी अंतर आहे. सासवड व यवतहूनही मंदिराकडे येण्यासाठी रस्ते आहेत. गडाच्या पायथ्याला भुलेश्वर वन उद्यान गावाच्या गायरान जमिनीत उभे आहे. पायथ्याला मोठी वसाहत होती. त्याच्या खाणाखुणा आजही लक्षवेधून घेतात. ढासळलेली मसजिजदही लक्ष वेधून घेते. हिरव्यागर वनराईने नटलेला परिसर व शिल्पसौदर्यांचा अनोखा नजराना खिळवून ठेवतो.
हा दौलतमंगळ अक्षरश: शेवटची घटका मोजत कसाबसा उभा आहे. या किल्ल्याच्या बाबतीत समाधानाची एकच गोष्ट म्हणजे, या किल्ल्यात असलेलं एक प्राचीन आणि तितकंच सुंदर शिवमंदिर अजूनही तग धरून आहे. म्हणूनच या डोंगरावर अनेक शिवभक्त शंकराच्या िपडीच्या दर्शनासाठी येत असतात, पण बहुतेकांना येथेच एक किल्ला होता असे म्हटले तरी पटणार नाही इतकं भीषण वास्तव या किल्ल्याच्या बाबतीत इथं घडलंय.
ब-याचदा फिरायला जायचे कोठे, त्याचे अंतर किती या प्रश्नांचा गुंता सोडवता-सोडवता आपले भटकणे राहून जाते. आणि नपेक्षा काहीतरी-कोठेतरी फिरूच म्हणून गजबजलेली ठिकाणे पाहिली जातात. म्हणूनच आपल्या इतिहासाचा जर अभ्यास आणि वाचन केले तर काही सुंदर नावे नक्कीच आपल्यासमोर येतील. दौलतमंगळचा डोंगर हे याच पंक्तीत भर घालणारं नाव आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर यवतच्या अलीकडे उजव्या बाजूला एक फाटा फुटतो. हा फाटा थेट माळशिरस नावाच्या गावात जातो. या गावात आलो की, एक डोंगर आपल्यासमोर ठाण मांडून उभा असतो. हा डोंगर जसजसा जवळ करू लागतो, तसतसं या डोंगराचा पडदा बाजूला होऊ लागतो. समोर येणारे बुरूज, दर्गा, तटबंदीचे अवशेष, पायरीमार्ग हे समोर येऊ लागतात. अन् मग आपल्या लक्षात येऊ लागते की, येथे फार पूर्वी एखादा किल्ला होता. खरंच आहे हे. हा डोंगर म्हणजेच पूर्वीचा दौलतमंगळ किल्ला! विजापूरचे सरदार मुरार जगदेव यांनी सन १६३४मध्ये बांधल्याची नोंद मिळते. हा गड इतिहासात काही प्रसिद्ध पावला नाही किंवा यावर काही घडामोडीही घडल्या नाहीत; पण हा किल्ला आपल्या उदासीनतेचं आणि दुर्लक्षतेचं एक सुंदर प्रतीक ठरला. कारण हा किल्ला आता पूर्णपणे नामशेष झाला आहे. याची खंत ना कोणालाच.. असो याचे अवशेष पार करत आपण डोंगरावर आलो की मग भुलेश्वरचं मंदिर जणू काही एखादं लेणंच अंगावर घेऊन उभं असल्यासारखं वाटतं. दुरून दिसणारं हे मंदिर जसंजसं जवळ येऊ तसंतसं अधिकच खुलताना वाटू लागतं.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला तटबंदी आडवी येते. या तटबंदीने संपूर्ण मंदिराला वेढलेलं दिसून येतं. मंदिराच्या पाय-या चढताक्षणीच द्वारपाल जय-विजय, पाय-यांवरील हत्ती, सिंह आदी शिल्पे पाहण्यासारखी आहेत. हे सारं ओलांडून आत आलो की, समोर मुख्य मंदिर दिसते. या मंदिराचा खालचा भाग हा दगडांमध्ये तर वरचा भाग विटांमध्ये बांधलेला दिसून येतो. यावरून याची बांधणी व जीर्णोद्धार हा वेगवेगळ्या कालखंडात झाल्याची खात्री पटते. शिखरावरील चुन्याच्या बांधकामावर गणेश, विष्णू आदी देवतांची शिल्पे कोरलेली दिसून येतात. हे सारं पाहत आपण नगारखान्याच्या इमारतीत प्रवेश करतो. मूळ मंदिराच्या बाहेर असलेली ही इमारत नंतरच्या कालखंडात बांधलेली दिसून येते. यानंतर येते ते सभागृह. या सभागृहातूनच आपण सुबक अशा दरवाजातून पाय-या चढून मूळ मंदिरात प्रवेश करतो.
या मंदिरात प्रवेश करताक्षणीच आतापर्यंत काबूत ठेवलेल्या आपल्या ओठातून लाजवाब, भारी, खूपच सुंदर.. असे अलंकारीत शब्द बाहेर पडले नाही तरच नवल! एखादा हिरा जसा कोंदणात ठेवला जातो, तसेच काहीसे हे आतील मंदिर वाटते. मंदिराच्या सुरुवातीस नंदीचा मंडप लागतो. या मंडपात एकूण १२ खांब असून, मधोमध नंदी आहे. या नंदीवरील कोरीव आभूषणांचे वर्णन करायचे झाले तर वेगळा लेख लिहावा लागेल. इतकं सुरेख आणि कोरीव काम कुठल्याही नंदीवर नसेल. नंदीमंडपानंतर अंतराळकक्ष आणि गर्भगृहाची बांधणी आहे. गर्भगृहात शंकराची सुरेख िपड आहे. तिन्ही मंडपाभोवती कलाकुसरींनी नटलेल्या शिल्पांचा महोत्सवच भरल्यासारखे वाटते. मंदिराच्या बाहय़ िभतीवर रामायण-महाभारतातील शिल्पपट कोरलेला दिसून येतो. या शिल्पाकृतींमध्ये यक्ष, अप्सरा, वादक, नर्तकी तसेच देवदेवता, प्राणी यांची चित्रे दिसतात. मंदिराच्या छताच्या बाजूला कोरलेली घंटेची माळ तर केवळ लाजवाबच! ही नक्षी भान हरपायला लावते. कोणती शिल्पे पाहू आणि किती पाहू.. यात आपल्या मनाचा पुरता गोंधळ उडून जातो. या सा-या शिल्पांमध्ये एक शिल्प मात्र मनाचा ठाव घेते. ते म्हणजे गणेशाचं स्त्रीमध्ये दाखवलेलं रूप! कोठेही सहसा न आढळणारं हे स्त्रीरूप मात्र आपल्याला कलेच्या नजरेनेच शोधावे लागते.
एखाद्या कलाकृतीकडून आपल्याला काय हवं असते? समाधान, विरंगुळा, ऊर्जा, मनाला छेडणारी तार.. हे सारं काही अनुभवायचं असेल तर भुलेश्वरच्या या मंदिराला अवश्य भेट द्या. एखादा धातू शोधायला जावे अन् अचानक हिराच सापडावा अशी काहीशी अवस्था भुलेश्वरचं हे अनुपम लावण्य पाहताना होत असते. कलेच्या सौंदर्यतेच्या मापदंडाचं परिमाण बदलणा-या अशा काही कलाकृती जेव्हा आपल्यासारख्यांच्या समोर येतात, तेव्हा आपसुकच या सौंदर्यतुषारात भिजण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. मानवी मनाला कलारसात ‘भुलवून’ सोडणारं हे भुलेश्वराचं सौंदर्यदालन पाहणं म्हणजे आपल्या भटकंतीचा निव्वळ बोनस ठरावा.
औरंगाबाद नुसते उच्चारले तरी लगेच वेरूळचे कैलासलेणे, अजिंठा लेण्यातील चित्रे, देवगिरीचा किल्ला आणि घृष्णेश्वर मंदिर हि पर्यटकांनी गजबजलेली ठिकाणे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. तशीच पर्यटकांनी गजबजलेली अनेक ठिकाणे पुण्याच्या आहेत, उदा. बनेश्वर, सिंहगड, तोरणा, वढू-तुळापुर, शिवनेरी, भीमाशंकर, इ. पण ह्या सर्व ठिकाणहून वेगळे असे पाहायचे असेल तर आपल्याला आपली पाऊले पुणे-सोलापूर महामार्गावरील भुलेश्वरला वळवायला लागतील. ज्याप्रमाणे वेरुळचे कैलासलेणे, तसेच यवतेश्वरच्या माथ्यावर वसलेले भुलेश्वरचे शिवमंदिर.
पुणे-सोलापूर महामार्गावर पुण्यापासून साधारणपणे ५५ कि.मीवर भुलेश्वर हे यवतेश्वर टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर यादवकाळात साधारणपणे बाराव्या शतकात मध्ये बांधलेले आहे. पण मूर्तिभंजक आक्रमकांनी मंदिर आक्रमण करून मंदिर उद्धवस्त केले व नंतरच्या काळात पुन्हा बांधले असावे (कारण मंदिराचे प्रवेशद्वार शिवकालीन गोमुखी प्रकारचे असून १३ व्या शतकात अश्या गुप्त दरवाज्याची काहीच गरज नव्हती, तसेच काही ठिकाणी भाजलेल्या विटांचा वापर केलेला आहे). भुलेश्वर मंदिराला दौलत मंगल किल्ल्याने आपल्यात सामावून घेतले आहे. हा किल्ला आदिलशाहाचे सरदार मुरार जगदेव यांनी बांधला आहे. काळाच्या ओघात दौलत मंगल किल्ला उद्धवस्त झाला, पण भुलेश्वर मंदिर सर्व आक्रमणांना तोंड देत उभे राहिले. दौलत मंगल किल्ल्याचे काही बुरुज आणि प्रवेशद्वार अजूनही साबूत आहेत.
पुण्याहून सोलापूरला जाताना यवतच्या अलीकडे दोन कि.मी अंतरावर भुलेश्वर फाटा आहे. भुलेश्वर डोंगराकडे जाणारा हा रस्ता दोरगेवाडीनंतर एकदम मोकळा आहे. मधूनच एखादे वाहन गेले तर, नाहीतर ह्या रस्त्याने जाणारी वाहने फार कमी. पावसाळा सोडला तर हा परिसर तसा रुक्ष. दोरगेवाडीतूनच डोंगरमाथ्यावरील भुलेश्वर मंदिर आणि त्याशेजारी असलेला दूरसंचार विभागाचा मनोरा आपल्याला खुणावत असतात. महामार्गापासून सुमारे १०कि.मीचे अंतर पार केल्यानंतर आपण भुलेश्वर डोंगराच्या पायथ्याशी येतो आणि इथून पुढे सुरु होतो वळणावळणाचा कठीण घाट. घाट पार केल्यानंतर आपण माथ्यावर असलेल्या पठारावर येऊन पोहोचल्यानंतर आपले लक्ष वेधून मंदिराचे कळस आणि दौलत मंगळ किल्ल्याचे मागे उरले अवशेष. मंदिराकडे जाताना मंदिराच्या खालच्या अंगाला असलेल्या घळीत ताशीव दगडात बांधलेले प्रवेशद्वार दिसते. प्रवेशद्वारातून जाणारा पायऱ्यांचा रस्ता हा बहुधा जुन्या काळातील किल्ल्यावर जाणारा मुख्य मार्ग असावा. प्रवेशद्वाराच्या जवळच थंडगार पाण्याचे टाके आहे.
भूलेश्वर मंदिर भव्य असून, एका पठारावर उभारले आहे. मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे. पठारावर वाहने उभी करण्यासाठी भरपूर जागा असून, मंदिराच्या मागच्या बाजूस दूरसंचार विभागाचा मनोरा आहे. चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी असलेल्या पायऱ्यांच्याइथे असलेल्या द्वारपालांच्या मुर्त्या आपले लक्ष वेधून घेतात. शिल्पकाराने द्वारपालांच्या अंगावर असलेले दागिने फार उत्तम कोरले आहे. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करीत आहे असे शिल्प कोरले आहे. मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून नागर शैलीत बांधलेले आहे. मंदिर गर्भगृह, अंतराळ, सभामंडप आणि नंदीमंडप असे चार भागात विभागेले आहे. मंदिराचे शिखर विटांचे असून ते नंतरच्या काळात बांधले असावे. शिखरावर अनेक पौराणिक प्रसंग, देवादिकांच्या मूर्ती आणि विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत.
मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवर आहे. फरसबंद आवाराजवळ आणखीन एक मंदिर आहे. आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूना प्रवेशद्वारे आहेत. या दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या सहाय्याने हवा खेळती ठेवली आहे. शिवाय आतील बाजूस उतुंग घुमटाकृती रचना असल्याने दगडातला थंडावा ऐन उन्हाळ्यातही टिकून असतो. हा सभामंडप मुख्य मंदिरापासून वेगळा करणारी आडवी भिंत आत आहे. अश्या आद्य भिंतीची रचना डोंगरी किल्ल्यावर आत येणाऱ्या शत्रूला चकवा देण्यासाठी केलेली असते. या आडव्या भिंतीमुळे पुढचा मार्ग दिसत नसल्यामुळे नवखा माणूस गोंधळून जातो. पण काळजीपूर्वक बघितल्यास याच अंधारी भागात डाव्या-उजव्या बाजूला वर जाणाऱ्या पायऱ्या आपल्याला दिसतात. पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर काय बघायचे आणि काय नाही बघायचे अशी आपली अवस्था होते. या मंदिरात आपल्याला कोरीव कामाशिवाय काहीही दिसत नाही. मंदिरात एकही कोपरा किंवा भिंत कलाकृतीशिवाय दिसणार नाही.
मंदिराच्या आतील तिन्ही बाजूना ओवऱ्या असून त्यांच्यावर शिल्पे कोरली आहेत. मंदिराच्या मध्यभागी गर्भगृह असून गाभाऱ्यात शंकराची रेखीव पिंड आहे. पिंडीजवळ पितळेची नागमुर्ती आहे. पिंडीसमोर असलेल्या खळग्यात भक्तिभावाने प्रसाद ठेवल्यास प्रसादाचा काही भाग देव ग्रहण करतो अशी भक्तांची श्रद्धा आहे. गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर दोन्ही बाजूस कीर्तिमुखे कोरलेली आहेत.
शंकराचे दर्शन घेऊन आपण जेव्हा सभामंडपात येतो तेव्हा काय बघू आणि काय नको अशी आपली अवस्था होते. सभामंडपाच्या तिन्ही बाजूना कोरीव कामची लयलूट आहे. सभामंडपात एकही असा मोकळा भाग नसेल जिथे कोरीव काम नाही आहे. गाभाऱ्यासमोर आहे स्वंतत्र नंदीमंडप. नंदीमंडपातील नंदीची मूर्ती सुस्थित असून मूर्तीवरील कोरीवकाम अप्रतिम आहे. नंदिमंडप आकाराने लहान असला तरी मंडपातील खांबांवर आकर्षक नक्षी काम आहे. नंदीमंडपातील खांबांच्या अग्रभागी यक्ष कोरलेले आहेत. मंदिरात जागोजागी हंस, लतावेल, मकर आणि कीर्तिमुख इ. प्रतिमा आढळतात. मंदिरात ब्रम्ही, ऐंद्री, माहेश्वरी, गणेशी, कौमारी, वैष्णवी, वाराही, भैरवी, चामुंडी इ. मातृकांची रेलचेल आहे. मातृकांची आयुधे आणि वाहने स्पष्ट कोरलेली आहेत. मातृकानंतर रेलचेल आहे ती नृत्यांगना, वादक आणि सूरसुंदरींची.
मंदिरात महाभारत आणि रामायण यांचे भव्य शिल्पपट आहेत. रामायणातील शिल्पपटात राम-भारत भेट, सीता स्वयंवर, तसेच सीता विवाहप्रसंगी करतात तो गौरीहरपूजन हा सोहळा दाखवला आहे. या शिल्पातील सीतेच्या भावमुद्रा, तिचे आणि सख्यांचे अलंकार, तोरणे नुसती बघतच राहावीत. महाभारतातील शिल्पपटात अर्जुनाचा मत्स्यभेद, कौरव-पांडव युद्ध, भीष्म बाणांच्या शय्येवर दाखवले आहेत, भीम गदेने हत्तींना मारत आहे, इ. अनेक प्रसंग कोरलेले आहेत.
मुख्य मंदिराच्या बाह्यभागात दगडी घंटेची आरास आहे. हि सर्व शिल्प बघत असताना एक गोष्ट नजरेत पडते ती म्हणजे या शिल्पठेव्यातील एकही मूर्ती अखंड नाही आहे. निष्टुर मूर्तीभंजकानी इथली मूर्तींवर घणांचे घाव घालून कोणाचे हात, कोणाचे कान, कोणाचे मस्तक आणि कोणाचे दोन्ही पाय तोडलेले आहेत. मूर्ती अखंड नसल्या तरी मूर्तींचे शिल्पसौंदर्य कमी होत नाही.
विनायकी गणेश
भुलेश्वर मंदिरात आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे ते म्हणजे गणपतीचे. आपण नेहमी गणपतीला पुरुषरुपात पाहतो, पण येथील गणपती स्त्रीरूपात आहे. हा गणपती विनायकी किंवा लंबोदरी, गणेश्वरी किंवा गणेशानी, विनायकी गणेश इ. नावानी ओळखला जातो. स्त्रीरूपातील गणेशाचे पाटेश्वरनंतर भुलेश्वर हे दुसरे ठिकाण आहे. विनायकी गणेशाचे दोन शिल्पपट भुलेश्वर मंदिर आहेत. या दोन्ही शिल्पपटात गणेशानी आणि दोन मातृकांच्या बाजूने भगवान महावीरांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. या दोन्ही शिल्पपटातील गणेशानी पद्मासनात आसनस्थ असून चारी हातात आयुधे धारण केलेली आहेत. पायाजवळ मूषक हे वाहनही कोरलेले आहे.
पुण्याचे वेरूळ शोभणाऱ्या भुलेश्वर एकदातरी भेट देऊन तेथील विनायकी गणेश आणि इतर अनेक शिल्पकृतींचे दर्शन घेतलेच पाहिजे. अखंड नसलेल्या तरीपण अप्रतिम वाटणाऱ्या ह्या शिल्पकृती बघताना त्या निर्माण करणाऱ्या अनेक अज्ञात कारागिरांना प्रणाम करण्यासाठी आपले हात आपोआप जोडले जातात.
Pune has been blessed with the places of utmost historical importance. As the city grew, these places were shadowed by the giant shopping mall buildings or were just forgotten, as city pushed these places on its outskirts. Now, one a year, devotees will gather here to remember and celebrate their gods, and the places will be deserted again for rest of the year. Bhuleshwar temple in Yawat, near Pune is one of these places. After having two (Just two for me) super tasty Vitthal Vadas in Vitthal Kamat restaurant which is located 45 kilometers from Pune, on Solapur highway, we took a right turn on Malshiras- Yawat road, scenery changed quickly. Busy roadside shops were replaced by nurseries and flower beds on both ends. As it was a returning monsoon, weather was rather brilliant, not too sunny, just perfectly overcast, with breezes flowing through our hairs and lush green everywhere. Road condition was superb, smoothly passing through few tiny villages, we reached temple in no time.
Mangalgad Remains
Bhuleshwar temple is located on a hilltop, 400 meters above sea level from where, someone can keep a watch on things going on around. It seems a better location to built a fort, and rather it was. Fort Mangalgad or fort Daulat Mangal was built here, by Adilshahi prime minister Murar Jagdev in 1629 to keep an eye on Pune region. Now all that remained is few scattered walls, few more half broken bastions and Bhuleshwar temple standing tall, on its highest point.
Entrance or Ves
As you drive closer to the temple, you start to see three temple towers surrounded by stone wall. Largest tower was painted in off white color odding it out of the rest two. I don’t understand why ASI who don’t even allow travelers to take the photos inside temples, allow this to do? It looks so out of place, hiding all of its authentic rustic beauty for which someone in past must have spent his entire life creating. Temple tower seems to be mosque styled dome, built with bricks, signifying the re construction of the temple in 17th century era.
Tower domes are surrounded by thin pillars with the domes with same design. Anyhow, leave your wheels at the parking lot and start walking towards the structure. Entire building is on the top of a strong platform, taller than usual temples. As you climb the stairs, you will find beautiful doorkeepers on both sides of the stairs. These broken keepers look out of the place, as they must have been lying somewhere, and later during the re built, they must have been used there as decorations. Leaving them behind, go ahead and reach the bell tower facing the temple entrance.
Ring that heavy brass bell to let Bhuleshwar know that you have arrived to his steps to seek his blessings. On quiet enough morning, you can here echoes of the bells you just rang, in the valley bellow.You can enter the main temple from three sides as the temple has three narrow doors, made up of strong black basalt stone.
Facing the godsDrums Room
On top of this entrance room, there is a Nagarkhana, or drum room where in earlier days, drums use to play in the morning and before the sunset. This room seems to be relatively new, as it is built with red bricks instead of stone. Nagarkhana towers are adorn with Ganesh, Parvati, Vishnu resting on five headed Shesh and much more. There are stairs on each side of the entrance hall, from outside, from where you can climb inside the Drum Chambers. As soon as you climb on the stairs, there is a small window to peep inside temple where you can get the first glimpse at Vigraha or the Shiva Lingam, all the way inside sanctum, 20-25 meters ahead. This is cleaver architecture arrangement was done to manage heavy crowd during auspicious days of year. Instead of getting in line and waiting, you can get a quick glimpse at god, and can make way so other devotees can get the Darshana as well. Quick and easy, suitable for the 5G age we live in. But we are not in hurry, so get inside the entrance hall.
Temple Second entrance
you get inside, the entrance hall has small Hanumaan idol welcoming you to the temple. Entrance to the Vigraha is decorated by a decorative door frame with Shalabhas, heavenly Swans and kirti Mukhas. If you stand straight facing the Hanumaan , it seems the temple has ended, its time to go home. But when you step inside the Hanumaan room, two stairs go upwards on both hands, leading you to the main temple.
Real temple begins
As you climb the stairs, first thing you see are the many beautifully carved pillars on which the temple towers have been erected. As you get use to the darkness, you came to know, almost all of the building space have been efficiently used to do some brilliant carvings. Carvings portray some known and many unknown stories from Puranas, Ramayna and Mahabharata.Next to the hidden stairs, there is a Nandi mantapa (Pillared pavilion) with some ornate pillars.
Bhuleshwar Nandi
Nandi is a main door keeper of Mahadev, who is sitting there, focusing all of his attention to the lord. He is teaching us how one should focous on Parmeshwar, with all the dedication. Here, in the Bhuleshwar temple, the monolith Nandi is ornated with some serious jewelry works, competing with the pillars under which it is resting.
Kirtimukh on PillarArdh Mandap
There is ArdhaMandapa or half pavilion in between Nandi and sanctum. Here, along with the pillars, even roof is packed with carvings. Yaksha are holding the roof, seating on the pillars. Brahma Vadinis, or celestial musicians are carved and elegantly place on the dome. Most of them are destroyed, but what is remained gives you the idea of their beauty. You can see Kirti Mukhas carved on pillars. A giant copper trishul (Trident), a weapon worthy only to gods, is kept in corner, ready to be wielded by Mahadev. As you cross this sub pavilion, few steps downwards take you to main Sanctum.
Bhuleshwar Garbhagruha
Door frame is carved out of black stone where Sapta matrika, Ganesha and apsaras are gathered, to greet Mahadev. Intricate design in between these gods fill up the remaining space of the frame. Bow your head, and enter through that narrow passage. Over the frame, you can see five sages, standing atop, with turrets over their heads adding an incredible symmetry to the whole door frame. Actual sanctum is plane simple room, without any carvings. It helps you focus on the god without any distractions. Shiva in Lingam form stays here, with an giant five headed cobra coiled around it. Khandoba, being one of the incarnation of Lord Shiva is also present here, in the mask form.
Parikrama MargRam temple and hidden pathway
Get the lord’s blessing and get out of the room, walk towards circumambulation path around three towers. There is a gap in between pradakshina path and outer wall of sanctum, where open skies and sun plays the game of shadows on the beautiful carvings on the walls. Pathway of the Bhuleshwar temple is made up of the similar stones, with roof, pillars, few smaller size shrines of other deities, stone mesh windows in between and all of that with brilliant carvings. Outside of sanctums are decorated with deities, handsome Aandharvas and gorgeous Apsaras. Apsaras, expert in the art of dancing and singing, have been carved here with elegance, radiating with their youthful energy. Few interesting and rare idols like Vainayaki, or Gamesh in female form can be seen over here.
MahabharatVainayaki
How can someone destroy something so beautiful? exclaimed my sister in law. After a while, from being lost in past, I recollected and dragged myself to present to this question. May be that is the problem with Abrahamic religions. “My religion is the only true religion and rest of the people either should follow me or be ready to die” is the biggest curse to humanity, its creativity and imagination, I thought. Sister in law was right. I mean, just look at the imagination, efforts, artistry, planning, resources it must have taken to create this marvel of such elegance. Even if you don’t agree with the particulate way of worshiping, can’t you just appreciate this human miracle? Just as a stunningly graceful art form, maybe? But no. Invaders went ahead anyhow, and destroyed each and every ‘infidel’ face on these walls that their hammers reached to. In 1528, Babari mosque was erected by Mir Baqui, after the destruction of Shri Ram temple. As I am writing this, the final verdict on Ayodhya Ram Janma Bhoomi has arrived, and my lord’s temple has to be rebuilt. I could not be more happy and thrilled. As I compare two temples, I wish, let this victory be the beginning of reclaiming our lost heritage, Indic pride and unification. I am praying to Shri Bhuleshwar, please grant us the strength to do this…
छत्रपती
शिवाजी महाराजांचे चरित्र वाचायला सुरुवात केल्यावर राजमाता जिजाबाई व
दादोजी कोंडदेव यांच्या बरोबर शिवरायांच्या प्रथम पुणे भेटीचा प्रसंग
आपल्याला वाचायला मिळतो.इ.स.१६३६ मध्ये शिवरायांनी जेव्हा पुण्यात प्रवेश
केला त्यावेळी त्यांना विजापूरकर आदिलशाही फौजेने सहा वर्षांपूर्वी
पुण्याचा केलेला विध्वंस बघायला मिळाला.इ.स.१६३० च्या पावसाळ्यात शहाजहान
बादशाहच्या मदतीस धावलेल्या आदिलशाहने मुरार जगदेव,रणदुल्लाखान.कान्होजी
जेधे, राया राव वगैरे सरदाराना शहाजी राजांच्या जहागिरीवर विजापुरी फौजेसह
रवाना केले होते. त्यावेळी मोगल( शहाजहान ) व निजामशाही यांतील संघर्षात
शहाजी राजे निजामशहा च्या बाजूने होते तर आदिलशाह मोगलांच्या बाजूने होता.
मुरार
जगदेवाने ‘ पुणे कसबा वस्ती जाळून गाढवाचा नांगर पांढरीवर ( नागरी वस्तीवर
)धरिला.पुण्याचा कोट पाडून शाहजीचे वाडे जाळिले व लुट केली;आणि
भुलेश्वराच्या डोंगरावर दौलत मंगळ किल्ला बांधून तेथून पुणे परगण्याचा
कारभार आदिलशाह कडून चालावा अशी व्यवस्था ठरविली.’ तसेच रस्त्यावर जमिनीत
एक लोखंडी पहार ठोकून तिच्यावर फाटक्या तुटक्या वहाणांचे आणि जोड्यांचे
तोरण टांगले ज्यातून ध्वनित करावयाचे होते कि आता हे गाव बरबाद करण्यात
आले असून पुन्हा ते कुणी आबाद करण्याचा प्रयत्न करू नये,तसे केल्यास तो
शाही अपराध समजला जाईल.
आदिलशाही फौजांनी विद्रूप केलेल्या
पुण्याचा चेहरा मोहरा बदलुन पुन्हा पूर्वीच्या वैभवशाली पुण्याच्या
पुनर्निर्मितीसाठी जिजामाता व दादोजी कोंडदेवांनी विविध उपाय योजना करून
पुण्याला पूर्वीची शान प्राप्त करून दिली. त्याचा श्रीगणेशा गाढवाचा नांगर
फिरवलेल्या पांढरीत अस्सल सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने जमीन नांगरून
करण्यात आला होता.
अशा रीतीने आपल्याला मुरार जगदेवांचे नाव माहित
पडते.हे मुरार जगदेव कोण,कुठले होते,त्यांची मराठ्यांच्या इतिहासात दखल
घेण्यासारखे कुठले कार्य,कामगिरी बजावली होती, ( सुरुवातीस नमूद केलेले
पुणे विध्वंसाचे कृत्य सोडून ) ,इ.प्रश्न बरेच दिवस माझ्या मनात घोळत होते.
मराठ्यांच्या इतिहासावरील माझ्या संग्रही असलेली पुस्तके वाचल्यावर मुरार
जगदेव यांच्या विषयी मिळालेली माहिती संकलीत करून समूहातील सदस्यांच्या
माहितीसाठी सादर करत आहे.
मुरार जगदेव यांचे मूळ गाव धोम ( सातारा )
हे होते.आपल्या कुशाग्र बुद्धी व स्वामी निष्ठेच्या जोरावर ते आदिलशाहीत
वजीर समतुल्य अधिकार,प्रतिष्ठा असलेल्या पदावर जवळपास पंचवीस वर्षे टिकून
राहिले.ते अत्यंत धार्मिक वृत्तीचे असून त्यांना आदिलशाहने ‘ महाराज
राजाधिराज ‘ ह्या पदवीने गौरविले होते..ऐतिहासिक लिखाणात त्यांचा मुरारी
पंडित,मुरार पंडीत ह्या नावांनी पण उल्लेख केलेला आढळतो. मुरार जगदेव यांचे
विजापूर दरबारात अनन्य साधारण महत्व होते.पण ते हिंदू व धार्मिक वृत्तीचे
असल्याने त्यांना विजापूर दरबारात छुपे शत्रू पण बरेच होते.
छत्रपती
शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.१६३० मध्ये झाला.तेव्हा शहाजी राजे आपल्या
आयुष्यातील अत्यंत अस्थिर राजकीय वाटचाल करत होते.मलिक अंबरचा
मृत्यू,मुर्तजा निजामशहा ने लखोजी जाधव ( जिजामाता यांचे वडील ),त्यांचे
दोन पुत्र अचलोजी व रघुजी,नातू यशवंतराव यांची भेटीस बोलावून विश्वासघाताने
केलेली हत्त्या,शहाजहान च्या प्रबळ फौजांकडून निजामशहावर होत असलेली
आक्रमणे,तात्कालिक स्वार्थासाठी आदिलशहा च्या नेहमी बदलणाऱ्या
भूमिका,निजामशाहीतील अंतर्गत हेवेदावे,वगैरे कारणांमुळे शहाजी राजांचे
चित्त पण कुठे स्थिर होत नव्हते.त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द
निजामशाही, ( अहमदनगरची,हैदराबाद निजामशाहीशी काही संबंध
नाही.)आदिलशाही,निजामशाही,मोगल,निजामशाही ह्या विविध शाह्यांमध्ये
गेली.शहाजी राजांच्या आदिलशाहीतील प्रवेश व तेथील दरबारी राजकारणात टिकाव
लागण्यामागे मुरार जगदेव यांची मोठी भूमिका होती. या संबंधात जेधे शकावलीत
म्हटले आहे कि,’ शके १५५८ शहाजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी
ईदलशहाकडून झाली.सरंजामास मुलुख दिल्हे त्यात पुणे देश राजांकडे
दिल्हा.त्यांनी आपले तर्फेने दादाजी कोंडदेउ मलठणकर यांसी सुभा सांगून
पुणीयास ठाणे घातले,तेव्हा सोन्याह नांगर पांढरीवर धरिला,शांती केली....’
कालौघात
मुरार जगदेव आणि शहाजी राजे यांचे सख्य,मैत्री इतकी वाढली कि मुरार
जगदेवानी पुणे जाळल्याच्या घटनेचे शल्य विसरून शहाजी राजे मुरार
जगदेवांच्या तुलाविधीस स्वतः जातीने हजर राहिले.भाद्रपद वद्य अमावस्येच्या
दिवशी—२३ सप्टेंबर १६३३—सूर्यग्रहण होते.या दिवशी पुण्यापासून दहा कोस
अंतरावरील भीमा व इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेल्या नागरगावी
सोने,रूपे,धान्य आदी चोवीस पदार्थांनी मुरार जगदेवांची तुला करण्यात आली.(
एका पदार्थाने एकदा,म्हणजे एकूण चोवीस वेळा.) अल्लाउद्दिन खिलजीने हिंदू
धर्मीय यादवांचे राज्य बुडविल्या नंतर च्या तीनशे वर्षांत वेद्घोषात झालेला
हा पहिला तुलाविधी होता.ह्या तुला विधीमुळे नागरगाव चे नवीन नांव ‘
तुळापुर ‘ झाले.
नागरगाव इथे तुला करण्याचे एक कारण असे पण सांगितले
जाते कि मुरार जगदेवांच्या अंगावर कुष्ठ उठले होते ज्यामुळे ते फार दुःखी
झाले होते.नागरगाव इथे रुद्रनाथ नावाचे सत्पुरुष होते.त्यांच्या दर्शनाने व
भीमा इंद्रायणी नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने त्यांचे दुखणे बरे
झाले.त्या प्रीत्यर्थ मुरार जग्देवानी त्या ठिकाणी संगमेश्वर म्हणून देवालय
बांधले.
शहाजी राजे,मुरार जगदेव,रणदुल्लाखान,व अन्य आदिलशाही
सरदारांनी उत्तरेकडून शहाजहान पुत्र शुजा,दस्तुरखुद्द मोगल सेनापती
महाबतखान यांच्या नेतृत्वाखाली चालून आलेल्या मोगली फौजांची परीन्ड्याच्या
आजूबाजूस कोंडी करून त्यांची रसद तोडून त्यांना दाती त्रूण धरून शरण
येण्यास भाग पाडले.विजयाची आठवण म्हणून मुरार जग्देवानी जगप्रसिद्ध मुलुख
मैदान तोफ जिचे वजन ५५ टन होते व अहमदनगर इथे निजामशाहीत ओतली ( बनवली )
गेली होती,विजापूरला नेली.त्यासाठी ४०० बैल,१० हत्ती तसेच शेकडो सैनिकांचा
उपयोग करावा लागला.भीमा नदीतून नेताना तिची नावच बुडाली,जी पुन्हा बाहेर
काढण्यासाठी अतोनात कष्ट,मेहनत घ्यावी लागली.अखेरीस २९ सप्टेंबर १६३२ रोजी
हे प्रचंड धूड विजापुरात पोहचले. ‘ धूळधाण ‘ नावाची अजून एक अवजड तोफ मुरार
जग्देवानी मुलुख मैदान तोफेबरोबर विजापूरला नेण्याचे प्रयत्न केले पण तोफ
वाहून नेणारा तराफा भीमा नदीत बुडाल्याने धूळधाण तोफेस पण जलसमाधी मिळाली व
काढता आली नाही.
आदिलशाहीची प्रदीर्घ सेवा करूनही मुरार जगदेवांचा
शेवट मात्र फारच करुणास्पद झाला.विजापूर दरबारात खवासखान म्हणून वजीर
होता.त्याचे व आदिलशहाचे काही कारणांवरून संबंध बिघडले.मुरार जगदेव व
खवासखान एक विचाराने,एक दिलाने काम करणारी जोडी होती.खवास्खानाने इ.स.१६३५
मध्ये शहाजहान कडे गुप्त रीतीने वकील पाठवून शहाजहान ला मोगली फौजा
विजापूरवर धाडण्याचा सल्ला दिला. त्या फौजेस लागणारी मदत आपण करू जेणेकरून
विजापूर राज्य मोगलांना जिंकता येयील असा भरोसा पण दिला.खवासखानाच्या
हालचाली विजापूरचा सुलतान महमद शहा यास कळल्यावर त्याने प्रथम खवासखानाची
हत्त्या केली.( ऑक्टोबर १६३५ ).त्यानंतर एक महिन्याने मुरार जगदेवाना पण
कैद करून,त्यांची जीभ छाटून,हात पाय मोडून विजापूर शहरातून धिंड काढून
त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे केले.
अशा तऱ्हेने एका कर्तृत्वशाली
व्यक्तीचा शोचनीय शेवट झाला.सत्तेच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींनी
त्यांच्या सेवाकाळात घेतलेल्या भूमिकांमुळे अशा व्यक्तींना प्रसंगी प्राणास
हि मुकावे लागल्याची भरपूर उदाहरणे इतिहासात सापडतात.
संदर्भ: ( १ ) मराठी रियासत..गो.स.सरदेसाई,खंड एक.
( २ ) राजा शिवछत्रपती ...पूर्वार्ध..लेखक बाबासाहेब पुरंदरे
( ३ ) मराठ्यांचा इतिहास..खंड पहिला.संपादक ग.ह.खरे आणि अ.रा. कुलकर्णी
भुलेश्वर देवूळ, bhuleshwar temple, which was built in 1230 by Yadava rulers.
भुलेश्वर देवूळ. पुणे सोलापूर मार्गावर ८० किलोमिटर यवत वरून उजवीकडे दहा ते पंधरा किलोमिटर.
Bhuleshwar temple, which was built in 1230 by Yadava rulers. 80 km away from Pune on Solapur Road, Maharashtra
भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी
किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा
कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या
राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी
करण्यात आले आहे. पुण्याचे पेशव्यांचे आध्यात्मिक गुरू ब्रह्मेद्र स्वामी
धवडशीकर यांनी या मंदिराला पुनर्रचना करावयाची कल्पना सांगितली.भुलेश्वर
मंदिर संकुलात ३ मजले आहेत. पण खालचे २ मजले सर्वांसाठी रहस्यमयपणे बंद
आहेत. मंदिराचा फक्त ३ या मजला खुला आहे.
मंदिरातील पिंड ही जमिनाखाली पोकळ स्वरूपाची आहे.एका भव्य नंदी मंडपात
उजव्या दिशेला डोके असलेला महाकाय सुंदर नंदी आहे.ही शैली दक्षिण भारतातील
अनेक मंदिरांमध्ये आढळते. नंदीच्या पुतळ्याच्या वरच्या भागावर अष्ट दिक्पाल
, नवग्रह अनेक देवता कोरल्या आहेत.
भूलेश्वर मंदिराला पुण्यातले वेरूळ म्हटले जाते.तेही बरोबरच आहे.सर्व
भिंती,खांबांवर,छतावर अक्षरशः प्रत्येक इंचावर सुबक मूर्ती कोरल्या आहेत.पण
सतत आक्रमणाने असंख्य मूर्ती तोडल्या आहेत,हे पाहून खूप हळहळ होते.
तरीही मंदिराचे सौंदर्य अप्रतिम आहे.या मंदिरात काही अद्भुत शिल्प आहेत.
१.भगवान गणेश, शिव आणि कार्तिकेय यांचे स्त्रीलिंगी शिल्प
हे दुर्मिळ शिल्पांपैकी एक असावे, जिथे नर देवतांना मादी म्हणून चित्रित
केले जाते.या गणेशाला विनायकी गणेश म्हणतात. प्राचीन भारतीय
शास्त्रांमध्ये, लिंग-तरलता असामान्य नव्हती. भगवान शिवाची अर्धनारीश्वर
संकल्पना असो किंवा महाभारतातील अर्जुनाचे बृहन्नला बनणे असो, लिंग हे
अंतिम स्वरूप नव्हते.
२.चामुंडा
या चामुंडा शिल्पातील विंचू, चामुंडाचे शरीर फासळे अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत.
३.रामायणपट
वेरूळप्रमाणे येथेही रामयणपट आहे.यात मध्यभागी राम व लक्ष्मणाची सुबक मूर्ती आहे.यात सीता स्वयंवराचा प्रसंग कोरला आहे.
४.महाभारत युद्ध प्रसंग
यात भीमाचा पराक्रम हत्तींसह युद्ध, भीष्म पराभव ओळखू येतात.शल्य वध सहज ओळखता येत नाहीत.
अर्जुनाने केलेला मत्स्य लक्ष्यभेद आणि द्रौपदी विवाह प्रसंग ओळखता येतो.
५.सुंदरी
अलौकिक सुंदर आभुषणांनी नटलेल्या, आकर्षक सौंदर्यंवतीशिल्प येथे कोरल्या
आहेत.परंतू यातील दर्पण सुंदरीचे मुख भाव शिल्प यात नीट राहिले आहे.तरीही
इतर वादकांचे वाद्य अतिशय सुबक आहेत.
६.समुद्रमंथन
समुद्र मंथन प्रसंगाखाली जी रत्ने मिळाली तीही इथे कोरलेली दिसतात.
७.मासोळी
शेषशायी विष्णू मंदिरात या मासोळी कोरलेल्या आहेत.अगदी ३ डी आर्ट वाटते.
८.दगडी कोरीव नक्षीदार द्वार
याची नक्षीदार जाळी , अप्रतिम कलाकुसर आहे.
No comments:
Post a Comment