चांगावटेश्वर मंदिर :-
सासवड – कापूरहोळ रस्त्यावर अतिशय निसर्गरम्य आणि शांत परीसरात चांगावटेश्वर मंदिर आहे. सासवड बसस्थानकापासून ३ ते ४ कि.मी अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर पण कर्हेच्याच काठी, उंचावर. इथे नदीकाठी भरपूर झाडी आहेत आणि त्या झाडीत भरपूर मोर विहरताना दिसतात.
या मंदिराची आख्यायिका अशी (ही आख्यायिका मंदिरात असलेल्या माहिती फलकाच्या आधारे)
“चांगदेव पावसाळ्यातील चातुर्मासातले ४ महिने मौनव्रताने व अंधत्व धारण करून म्हणजेच डोळे मिटुनच सर्व व्यवहार करीत. त्यांचे नित्य पार्थिव लिंग पुजेचे असे. त्यांचा शिष्य काळ्या मातीने मळुन केलेले लिंग डाव्या हातावर घेऊन त्याची विधीयुक्त पुजा करीत असे. एक दिवशी सारख्या कोसळत असलेल्या पावसामुळे शिष्याने कंटाळुन एका मोठ्या पालथ्या वाटीवरच थोड्याशा मातीचे लिंपन तयार करून तेच पार्थिक लिंग म्हणुन तयार करून ठेवले. चांगदेवाने नित्यनियमाने स्नान उरकुन पार्थिव लिंगास आव्हानात्म मंत्रोक्षता वाहून ते उचलून हातावर घेण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ गेला. ते हलविले न जाणारे स्वयंभू लिंगच चांगदेवास दिसुन आले. त्याने छोटेसे मंदीर बांधून त्या स्वयंभू लिंगाची उपासना कायम ठेवली. यावरूनच या मंदिरास चांगावटेश्वर असे नाव पडले. या मंदिराचा जिर्णोद्धार सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी सन १७०० मध्ये केला. सध्या देवस्थान मालकी हक्क सरदार जयसाहेब राघवेंद्र पुरंदरे यांच्याकडे आहे.”

चांगावटेश्वर मंदिर
चांगावटेश्वर मंदिर हे पेशवेकालीन शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. दगडी सभामंडपावर केलेलं कळसांचं विटांचं बांधकाम हे मराठा शैलीतलं.दहा ते बारा फुटांचं दगडी बांधकाम व त्यावर त्याच उंचीचे विटांचे बांधकाम आहे. मंदिर पुर्वाभिमुखी असून मंदिराला २५ दगडी पायऱ्या आहेत. या ही मंदिराची रचना संगमेश्वरशी मिळतीजूळती आहे. मंदिरावरील नक्षिकाम अप्रतिम आहे तसेच दीपमाळ, कासव, नंदी, सुंदर आहे.
मंदीराच्या समोरून एक पाण्याचा ओढा जातो.
![]() |
चांगावटेश्वर मंदिराचा कोट |
मंदिराला बाहेरून एखादा कोट असल्याप्रमाणे दगडी तटबंधी आहे. त्या तटबंधी मधुन मंदिरामध्ये जाण्यासाठी काही पायऱ्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करतो.
![]() |
चांगावटेश्वर मंदिर |
मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे, तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडपात उभा आहे. या मंदिराचे खांब हे थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत. दोन खांब एकमेकाला बिलगून एक खांब व काही चार खांब एकमेकाला बिलगून एक खांब असे पाहायला मिळते. तर त्या खांब व मंदिरा वरील नक्षी काम इतके अप्रतिम आहे कि फक्त पाहत रहावेसे वाटते.नक्षीकाम तर इतके वैविध्यपुर्ण आहे कि दृष्टीला एक सुख देऊन जाते.प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी, दधि-मंथन करणारी स्त्री, गरुड, युगुल, लढत असलेले मल्ल, तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे. तसे कमल पुष्पे, शृंखलांच्या माला, नृत्यांगना यांचे सुबक व कोरीव काम केलेले दिसते.
मानवी जीवनाच्या निरनिराळ्या प्रसंगातील भावनांचा उत्कृष्ट रसाविष्कार करण्याच्या नयनरम्य कलाकृती विविध प्राणी गेंडा, अश्व, व्याघ्र, यांच्या स्तंभावरील शिल्पकला इथं पहायला मिळतात.
सभामंडपाच्या मध्यभागी जवळपास ६ फुटाचा मोठा व देखणा नंदी असून त्यावर नंदीच्या गळ्यातील माळा, घंटा तसेच विविध अलंकार कोरलेले आहेत.

गर्भगृहात प्रवेश करताना पायरीवर खालच्या बाजूला कीर्तिमुख तर वर कोरलरली गणेश मूर्ती पहायला मिळते. गर्भगृहात महादेवाची सुंदर पिंड आहे.
येथे एका स्तंभावंवर दोन ठिकाणी महिषासुरमर्दिनीची शिल्पे आहेत. हाती शस्त्र घेऊन दुर्गा महिषाचा संहार करतेय. वध होत असताना महिष आपले महिषरुप टाकून धडातून प्रकट होताना दिसतोय.
स्तंभावर कोरलेलं शरभ शिल्प 
शरभ आणि अश्व
गजाबरोबर असलेलं हे शिल्प गेंड्याचं का रानडुकराचं हे मला नीटसं कळत नाहीये.
ताक घुसळणारी स्त्री
नर्तक
सुबक नक्षीकाम
शाखामृग
कुस्तीगीर आणि नर्तक
पिसारा फुलवून नाचणारा मोर
अजून काही शिल्पे
मंदिराच्या सभामंडपातील स्तंभांवरच उपरोक्त शिल्पे आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या मध्ये अंतराळ आहे.
मंदिराचा अंतर्भाग
| श्री चांगावटेश्वर मंदिर - सासवड |
अंतराळ व गाभारा
वर सांगितल्याप्रमाणेच मंदिराचा बाह्यभाग हा संगमेश्वरासारखाच आहे. पेशवेकालीन कळस मात्र हल्लीच सोनेरी रंगाने रंगवुन काढलेला आहे.
पेशवेकालीन कळस
संगमेश्वर मंदिर :-
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व चांबळी (भोगवती) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे. सासवड बसस्थानका पासून साधारण १ कि.मी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे. कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नदयांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर आहे. सासवडला कर्हेच्या काठावर सोपानकाकांचं समाधी मंदिर आहे आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला आहे ते संगमेश्वर मंदिर. पावसाळा सोडता कर्हा नदीला नगण्य पाणी असतं तेव्हा ती सहज ओलांडता येते मात्र पावसाळ्यात नदी अगदी फुफाटत वाहत असते तेव्हा संगमेश्वरला जायला थोड्या अंतरावरचा नदीपूल वापरावा लागतो. हे मंदिर नीरा नदीच्या उपनद्या कऱ्हा व भोगावती (चांबळी) या नद्यांच्या संगमतीरी संगमेश्वर मंदिर वसलं आहे. संगम हे मराठी, हिंदी, संस्कृत आणि तमिळ हे संगमाचे नाव आहे आणि म्हणूनच मंदिरातील प्रमुख देवता भगवान संगमेश्वर (शिव) आहे.

संगमेश्वर मंदीराचे ब्रिटीशकालीन चित्र



मंदीराच्या आवारात दीपमाळ बघायला मिळते
पेशेवेकालीन असलेलं हे मंदिर त्याची स्थापत्य कला व बांधकाम शैली पाहण्यासारखी आहे. संगमेश्वर मंदिराचे बांधकाम देखील हुबेहुब श्री चांगावटेश्वर मंदिरा सारखे आहे पण या मंदिराचा खांबा वरती तितके नक्षीकाम नाही.
| संगमेश्वर मंदिराचा गाभाऱ्या मध्ये असलेला लाकडी कळस - सासवड |

संगमेश्वर मंदीराचा तलविन्यास
मंदिराच्या रचनेवरून ते निश्चितपणे उत्तर यादवकालीन आहे. मात्र, कुणी आणि केव्हा बांधले याचे दाखले मिळत नाहीत. त्यासाठी अनेक कागदपत्रे आणि शिलालेखांचाही शोध घेतला मात्र, उल्लेख मिळत नाही. मंदिर छोट्या टेकडीवजा उंच जागी आहे. या ठिकाणी खडकेश्वर मंदिरही आहे, त्यामुळेच या जागी असणाऱ्या उंच खडकावर ही मंदिरे बांधली गेल्याचे लक्षात येते. संगमेश्वरासह वटेश्वर, सिद्धेश्वर, नारायणेश्वर ही मंदिरे समान कालखंडातली असल्याने त्यांचा निर्मितीकाल हा परिसरात समृद्धी नांदत असल्याचे सांगतो. नंदी वा वाहनमंडप, त्याच्या सभोवतीचे कक्षासन त्याच्या कालखंडाची साक्ष देतात. पेशवाईत सखारामबापू बोकील यांनी पायऱ्यांचा घाट इथे बांधला, तर ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट मॅकविल ग्रिंडलेने या मंदिराचे चित्रही काढले. हा सगळा परिसरच इतिहासाच्या पाऊलखुणांनी समृद्ध आहे.'

१८१३ ला इंग्रजी चित्रकार रॉबर्ट मेलविल ग्रिंडले (Grindlay, Captain Robert Melville) याने काढलेले “View of Sassoor in the Deccan” हे कऱ्हे काठच्या संगमेश्वर मंदिराचे चित्र काढले. आज सासवड मधले पडक्या वाड्यांचे आणि कऱ्हेच्या घाटांचे अवशेष पाहताना स्थित्यंतराच्या खुणा सोडल्या तर कॅप्टन ग्रिंडलेने अतिशयोक्ती केलेली नाही असे सहज वाटले.
जीर्णोध्दाराच्या आधीचा कळस
मंदिराचे पेशवेकालीन कळस तर अतिशय सुंदर दिसतात. ह्याच कळसांवर विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या शिखरावर सलग थरांमध्ये कोरलेली अनेक लहान शिल्पे आहेत, आणि तरीही, त्यापैकी बहुतेक काळाच्या ओघात अस्पष्ट झाली आहेत, तरीही ती मुख्य मंदिरावर आणि इतर बाह्य मंदिरांवर स्पष्टपणे दिसतात.

यादवकालीन सभामंडप
मंदिराच्या
परिसरातील तुळशी वृंदवनाची रचना ही कल्पक आहे. या तुळशीवृंदावनात वर तुळस
मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या
महादेवाच्या पिंडीवर पडते.
मंदीराच्या आवारात ओवर्या आहेत.
मंडपातील स्तंभावर जयविजय मूर्ती कोरलेल्या दिसतात.
संगमेश्वर मंदिर तसं उंचावर वसलेलं आहे. म्हणजे एक लहानसा कोट उभारुन त्यावर मंदिर बांधलेलं आहे. मंदिरात शिल्पं अजिबात नाहीत पण एकंदरीत मंदिराचं बांधकाम देखणं आहे. सभामंडप आणि गाभारा हे यादवकालीन शैलीत तर कळसाचा भाग हा नंतर पेशवेकालीन मराठा शैलीत बांधला गेला किंवा जीर्णोद्धारीत झाला. येथे नंदीमंडप नाही किंवा तो पूर्वीच भग्न झाला असावा. एक जुना भग्न नंदी मंदिराच्या आवारात दिसतोच. सभामंडपात पेशवेकाळात कधीतरी नव्या नंदीची स्थापना झालेली दिसते.


या नंदीच्या मानेवर नाग आहेत

बाहेर ठेवलेला जुना नंदी
अर्धवट खराब झालेला दगडी बांधलेला नंदी मंदिरासमोर आहे, तर नदीच्या बाजूला अजून एक नंदी आहे.
घडीव पायऱ्या चढून वर आल्यानंतर प्रथम लागतो तो नंदीमंडप अन त्यात असेलेला शिल्पांकित नंदी.त्याच्या समोरच तीस दगडी खांबावर उभारलेला मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दीपमाळा आहेत.

सभामंडपात नंदीपुढे एक कासव कोरले आहे. या कासवाच्या अंगावर वेगळ्याच प्रकारची नक्षी बघायला मिळते.

नंदीमंडपातुन
सभामंडपात प्रवेश करतेवेळी डाव्या हाताला देवडीत शेंदूर लावलेली गणरायाची
मूर्ती आहे तर उजव्या हनुमंताची. मंडपाच्या केंद्रस्थानी दगडी कासव कोरलेले
आहे. मंडपात दक्षिणोत्तर दोन प्रवेशद्वारे आहेत.मंदिरातील भागात दगडी कासव
आणि मंदिरावरील नक्षीकाम सुंदर आहे.

गर्भगाराच्या दगडी चौकटीवर व त्याशेजारील स्तंभावर वेलबुट्ट्यांचे मनोहर नाजूक नक्षीकाम आहे.

गाभार्यात शिवपिंड दिसते. छोट्या घंटाचा मंजुळ नाद आणि पार्श्वभुमीवर सुरु असणारा मंत्रघोष आणि यात भरीला आजुबाजुचा निवांत परिसर यामुळे इथे मनशांती मिळते. दर्शन घेउन आता मंदीराच्या बाहेरुन फेरी मारुया.
ळस
मंदिराच्या बाह्यभिंती
मंदीराची भिंत तारकाकृती आकारात का असते याचा एक विचार असा कि हि भिंत स्टेलेट प्लॅन ( तारकाकृती तलविन्यास ) भिंत अंदाज दगडी कोपऱ्यांवर शिखरापर्यंत उंच ठेवली जाते. शिखर हे विटा आणि चुन्यामध्ये बांधलेले आहे आणि त्यात सूक्ष्म कुटांचा समावेश आहे (कुट कुट या शब्दाचे अनेक अर्थ आहेत ज्यापैकी एक म्हणजे "डोंगराचे शिखर किंवा शिखर". याचा अर्थ "शेवट" असा देखील होतो. किंवा “कोपरा”. अमरकोश (vv. 1072, 641) नुसार , कूट म्हणजे धान्याचा ढीग किंवा डोंगराच्या शिखराचा अर्थ, शिखर किंवा श्रृंगचा समानार्थी )

भूमितीमध्ये, स्टेलेशन ही एक बहुभुज 2 मितींमध्ये, पॉलीहेड्रॉनला 3 मितींमध्ये, किंवा सर्वसाधारणपणे, एक नवीन आकृती तयार करण्यासाठी n परिमाणांमध्ये पॉलीटोप विस्तारित करण्याची प्रक्रिया आहे. मूळ आकृतीपासून सुरुवात करून, प्रक्रिया विशिष्ट घटक जसे की त्याच्या कडा किंवा फेस प्लेन, सामान्यत: सममितीय पद्धतीने विस्तारते, जोपर्यंत ते पुन्हा एकमेकांना भेटत नाहीत तोपर्यंत नवीन आकृतीची बंद सीमा तयार होते. नवीन आकृती मूळची तारा आहे. स्टेलेशन हा शब्द लॅटिन स्टेलाटस , “तारांकित” वरून आला आहे, जो यामधून लॅटिन स्टेला , “स्टार” वरून आला आहे. स्टेलेशन ही फेसिंगसाठी परस्पर किंवा दुहेरी प्रक्रिया आहे . खाली तारांकित डोडेकॅगॉनचे बांधकाम आहे : Schläfli चिन्ह {12/5} सह नियमित बहुभुज. यादव कला आणि स्थापत्यशास्त्रात, मंदिराच्या पायथ्याचे तारामय डिझाईन त्याच्या तालबद्ध अंदाज आणि अवकाशांसह टॉवरमधून सुशोभित स्तरांच्या क्रमवारीत केले जाते.

मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळीच्या तीरावर ही महादेवाचं मंदिर आहे.
भैरवनाथ मंदीर :-
सासवडमध्ये असलेले हे मंदीर बाहेरुन बघून अंदाज येत नाही, पण तरीही एका गोष्टीसाठी या मंदीरात आवर्जून जावे.




आत
शिरताच वरती एक जुनी मोठी घंटा आहे. तिला बघताच तिच्यावर कोरलेले
‘DOMINIC’ ही अक्षरे लगेच दिसते ही तर पोर्तुगीज घंटा याची खात्री पटते.
अशा अनेक घंटा चिमाजी अप्पांनी वसईची लढाई जिंकून तिथल्या चर्च मधून
विजयाचे प्रतीक म्हणून इथे महाराष्ट्रात आणल्या आणि जागोजागी आता त्या
देऊळात भूषण म्हणून दिसतात
घंटेच्या पुढे, वरती, एक सुंदर झुंबर व काचेचे पुरातन दिवे लटकत आहे
घंटेच्या पुढे, वरती, एक सुंदर झुंबर व काचेचे पुरातन दिवे लटकत आहे


























































































No comments:
Post a Comment