इंडिया दर्पण विशेष - भटकूया आनंदे - लोंझा किल्ला - India Darpan Live
अस्पर्शित आणि पिटूकला लोंझा किल्ला
गौताळा अभयारण्याच्या गर्द छायेत विसावलेल्या अंतुर किल्ल्याच्या प्रभावळीमध्ये एक पिटूकला अस्पर्शित असा ‘लोंझा’ किल्ला काही वर्षापूर्वीच प्रकाशझोतात आला आहे. नाशिकमधील हेमंत पोखरणकर आणि ठाण्यातील राजन महाजन या अभ्यासू गिर्यारोहकांना मराठवाडय़ातील अंतुर किल्ल्याच्या माहितीसाठी मध्यंतरी ‘गुगल’वरुन ‘सॅटेलाईट’ नकाशा बघत असताना अंतुरच्या पश्चिमेला, अजिंठा – सातमाळ डोंगररांगेपासून सुटावलेल्या एका गोलाकार डोंगरावर आयताकृती टाक्यांसदृश्य काही आकृत्या आढळल्या. या आकृत्या काय असाव्यात या कुतूहलातून, त्याचा पाठपुरावा सुरु झाला आणि एका या नव्या किल्ल्याचाच शोध लागला. या गिर्यारोहक मित्रांनी अधिक संशोधन करून ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’, ‘गिरिमित्र संमेलन’ आणि ‘एशियाटिक सोसायटी जर्नल’ मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध करून याला अधिकृत मान्यता प्राप्त करून दिली. या किल्ल्याचं नांव आहे ‘लोंझा’…

गिर्यारोहक व दुर्ग अभ्यासक
अजिंठा पर्वतरांग कण्हेरगड, अंतुर, सुतोंडा, वेताळवाडी, वैशागड अशा दिग्गज किल्ल्यांना डौलाने मिरवते तर पितळखोरा, रूद्रेश्वर, घटोत्कच आणि अजिंठा अशा लेणी लेवून नटलेली आहे. चाळीसगावहून औट्रमघाट मार्गे गौताळा अभयारण्याच्या अलिकडे, अंतूर किल्ल्याला लागून असलेल्या सलग अशा पठाराच्या खालच्या बाजूला छोटा आणि टूमदार दुर्ग लोंझा उभा आहे.
लोंझा गाठण्यासाठी चाळीसगांव- सिल्लोड रस्त्यावरील नागद गाव गाठायचं. नागदहून बनोटी गावाच्या रस्त्याला लागताच अगदी एक कि.मी. अंतरावर ‘शंभू ध्यान योग आश्रम – महादेव टाका’ असा बोर्ड दिसतो तिथून वळायचं आणि सहा-सात कि.मी. अंतरावर या लोंझा किल्ल्याच्या पायथ्याला वाहन पार्क करायचं. या संपूर्ण परिसरात ‘किल्ला’ किंवा ‘लोंझा किल्ला’ कुणालाही माहिती नाही. तिथे चौकशी करतांना ‘महादेव टाका’ या नावानेच विचारणा करावी. कारण, स्थानिकांच्या भाषेतला महादेवटाका म्हणजेच लोंझा किल्ला. नासिक – चाळीसगांव (व्हाया मालेगांव) – कजगाव – नागद – महादेव टाका डोंगर असे हे अंतर १९१ किलोमीटर आहे.
अजिंठा रांगेत भ्रमण करण्यासाठी वर्षा ऋतू सर्वांत योग्य. गाडीतून खाली उतरताच आपण अतिशय शांत आणि गर्द झाडोऱ्याने अच्छादित अशा अस्पर्शित ठिकाणी आलो आहोत असा फिल मिळतो. समोर डोंगराककडे बघितलं तर लोंझा एकदम पिटूकला आहे. लोंझा किल्ल्याचा अर्धगोलाकृती आकार आणि त्यावरची झाडी पाहून सुतोंडा, दुंधा आदि किल्ल्यांची आठवण येते. सॅटेलाईट नकाशातील समुद्रसपाटीपासून उंची अंदाजे ४८५ मीटर तर पायथ्यापासून अंदाजे ८५ मीटर! कुर्मगतीने रमत गमत चढलो तरी पंधरा-वीस मिनिटांत गडमाथा गाठू शकतो.

मागच्या मुख्य डोंगररांगेतून पुढे आलेली सोंड व महादेव टाक्याचा डोंगर यांच्या खिंडीतून वर जायला सिमेंटच्या पायऱ्यांचा सोपा सोपान आहे. या पायऱ्या संपतात तिथे पूर्वीच्या खोदीव पायऱ्यांचे अवशेष दिसतात. नजीकच्या काळात याही सिमेंटने झाकल्या गेल्या आहेत. पुढे प्रवेशद्वाराच्या जोत्याचे दगडही दिसतात त्यावरून डोंगर नसून एक किल्लाच असल्याची खात्री होते. या पडक्या जोत्यावरून हे प्रवेशद्वार किती सुंदर असेल याची कल्पना करत पुढे सरकावं. इटुकला लोंझा किल्ला आता त्याच्या जवळचा पाणीसाठा, कोरीव गुफांचा अविष्कार दाखवणार असतो.
समोरच वरच्या अंगाला डावीकडे, आतून लालसर रंग असलेले, लेणे खोदलेले आहे. त्यात अगदी असष्ट असं नक्षीकाम आणि कोरीव काम आहे. अभ्यासकांच्या मते ते हिनयान काळातील लेणं आहे! किल्ल्याबरोबरच एक लेणंही उजेडात येतं. पश्चिमेसच थोडे खाली, ४० फूट रुंद, रुंद ३८ फूट लांब आणि ६ फूट उंच अशी प्रशस्त गुहा आहे. सध्या तिथे एक बाबाजी वास्तव्यास आहेत. गुहेत अलीकडच्या काळातील शिवलिंग आहे. श्रावणात आणि महाशिवरात्रीला या महादेवाच्या दर्शनासाठी डोंगरावर गर्दी असते.
या गुहेच्या मध्यभागी ४ खांब आहेत. गुहेचा प्रवेशमार्ग कातळ खोदून कल्पकतेने तयार केलाय. या गुहेच्या डावीकडे, ५ खांब असलेले आणखी एक टाके आहे. आत उतरण्यास चार पायऱ्या आहेत. सध्या डोंगरावर पिण्यालायक पाण्याचा हा एकमेव साठा आहे. अभ्यासकांच्या मते हेही पूर्वी लेणे असावे. या टाक्याच्या डावीकडे, काही अंतरावर १ टाके आहे. पुढे असेच प्रचंड आकाराचे (९८ फूट रुंद, ११फूट लांब आणि २ फूट उंच) पण अर्धवट खोदलेले खांबटाके आहे. त्यातील कोरीव खांब स्पष्ट नजरेस पडतात.
वायव्येकडील नागदच्या बाजूस जवळपास ४५ खोदीव पायऱ्या आहेत. या पायऱ्यांलगत एका देवीच्या मूर्तीची स्थापना केलेली आढळते. पण ती अलिकडील असावी. पूर्वेला एक खांबटाके आहे. सध्या ते मातीने बुजलेले आहे. दक्षिणेला व नऋत्येला तब्बल १० टाक्यांचा समूह आहे. पैकी एक खांब टाके आहे. या समुहातील सर्वात मोठ्या टाक्याची रुंदी ५८ फूट तर लहान टाक्याची रुंदी २० फूट आहे. दोन दक्षिणोत्तर आणि इतर पूर्व-पश्चिम पसरलेली आहेत. माथ्यापासून थोड्या खालच्या भागात किल्ल्याच्या परीघावर पसरलेले हे टाक्यांचे जंजाळ पाहून वर गडमाथ्याकडे चाल करायची.

माथ्यावर जाताना दक्षिण बाजूस जोत्यांचे अवशेष दिसतात. यामध्ये एक जोतं मोठय़ा वाडय़ाचे आहे. वाडय़ाच्या कोपऱ्याकडील दगडाच्या भिंती अजूनही तग धरुन आहेत. या साऱ्याच कधीकाळच्या गडकोटाच्या खुणा! येथेच एका पीराची स्थापना केलेली आहे. पीराच्या स्थानामुळे याला पीरबर्डी असेदेखील म्हणतात. बर्डी म्हणजे छोटा डोंगर. या माथ्यावरच अलिकडे स्थापन केलेली हनुमानाची मूर्तीही दिसते. माथ्यावरुन पूर्वेस अंतुर, दक्षिणेस अजिंठा डोंगररांग, उत्तरेस नागद परिसर तर पश्चिमेला वडगांव धरणाचा विहंगम परिसर दिसतो.
टाकीसमुहापासून खालच्या टप्प्यावर पूर्व बाजूपासून पश्चिमेपर्यंत सलग तटबंदीचे अवशेष दिसतात. तटाचा बराचसा भाग मातीमुळे झाकला गेला आहे. दक्षिण बाजूस तटात उपद्वाराचे (चोरदरवाजा) बांधकाम आढळते. तटबंदीचा दगड घडीव आहे. तटबंदीचे अवशेष, दरवाजे, खोदीव पायरी मार्ग, टाक्या, खोदीव लेण्या, शिबंदीच्या घरे-वाडय़ाची जोती या साऱ्या गोष्टींवरून हा किल्ला तर नक्कीच होता. हे बांधकाम पाहता ते मुस्लिमपूर्व राजवटीतील आहे हेही नक्की. मग हा किल्ला कुठला, त्याचा इतिहास काय? असा प्रश्न आपल्याला पडतो.
या परिसरातील लोक या डोंगराला ‘महादेव टाका’ या नांवानेच ओळखतात. इथला पत्रव्यवहाराचा पत्ता विचारल्यावर – लोंझा शिवार- नागद, ता. कन्नड जि. औरंगाबाद, असा पत्ता मिळाला. आणि हाच पत्ता दुर्गाचे नांव निश्चित करण्यास सहाय्यभूत ठरतो. ‘औरंगाबाद गॅझेटीअर’मध्ये या दुर्गाचा ‘लोंघा’ असा नाममात्र उल्लेख आहे आणि गावांच्या यादीत ‘लोंझा’ असे नाव आहे. लोंझा किल्ला इतिहासाच्या बाबतीत थेट काही बोलत नाही परंतु नजीक असलेल्या नागद गावाचा इतिहास थोडाफार बोलतो. नागद गावात इ.स. 655 चा ताम्रपट मिळालेला आहे. यावरून सेंद्रक नृपती निकुंभाल्लशक्ती याने पुण्य मिळविम्यासाठी ब्राह्मणास गाव दान देण्याचा उल्लेख आहे. त्यानंतर कलचुरी (हैहय) राष्ट्रकूट यादव यांची राजवट नागदला होती. दुर्ग लोंझा नागदपासून हाकेच्या अंतरावर असल्याने या राजवटींचा लोंझावर ताबा असण्याची शक्यता असावी.
भटकंती करतांना सर्वात प्रामुख्याने भुगोलाची आवश्यकता असते. ज्याचा भुगोलाचा अभ्यास पक्का त्याला कुठल्याही शास्त्राचा अभ्यास करणे सोपे असते. एका ‘सॅटेलाईट’ नकाशाच्या पाहण्यातून एक अज्ञातवासात गेलेला किल्ला पुन्हा प्रकाशात आला. किल्ला प्रकाशझोतात आल्यापासून अगदी मोजकेच गिर्यारोहक लोंझा भेटीला जावून आलेले आहेत. एकांतात असलेल्या अस्पर्शित लोंझा किल्ला भेटीसाठी तुम्ही कधी निघतांय?
महादेव टाका डोंगर : लोंज्याचा किल्ला
- तेजस्विनी आफळे
मराठवाडा आणि खान्देशाच्या सीमेवर कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्याच्या निसर्गरम्य परिसरात लोंझा गावाजवळ हा महादेव टाक्याचा डोंगर आहे. येथील शिवलिंगामुळे स्थानिकांमध्ये या डोंगराला धार्मिक ओळख प्राप्त झाली आहे. डोंगररांगेतून सुटून एकलकोंडा उभ्या असलेल्या या डोंगराची उंची पायथ्यापासून सुमारे २८० फूट आहे. काही वर्षांपूर्वी अंतूर किल्ला व या परिसराची गुगल नकाशांद्वारे माहिती घेत असताना अंतूर किल्ल्याच्या पश्चिमेला उभ्या डोंगरावर किल्ल्याचे अवशेष असल्याचा शोध ठाणे-नाशिक येथील राजन महाजन आणि हेमंत पोखरणकर या गिरीप्रेमींना लागला. दोघांनी प्रत्यक्ष डोंगराला भेट देऊन मोजमापे व छायाचित्रे घेत किल्ला व येथील अवशेषांना प्रकाशात आणले. लोंझा गावाच्या सान्निध्यामुळे, स्थानामुळे लोंज्याचा किल्ला, असे नामकरण झाले. हे आपल्या ऐतिहासिक ठेव्याच्या शोध-संशोधनामध्ये आधुनिक साधनांच्या वापराचे अगदी सोपे आणि उत्तम उदाहरण मानता येईल.
तिस-या दुर्ग साहित्य संमेलनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या दुर्गप्रेमीच्या अंकात नि.रा. पाटील यांनी या किल्ल्याबद्दल अधिक माहिती प्रसिद्ध केली. त्यांच्या मते या डोंगराच्या दक्षिणेला असलेली गौताळा डोंगररांगेची सोंड आणि डोंगर यामधल्या खिंडीतील बांधीव पाय-या एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला परिसरातील भिल्ल पुंडाईचा नायनाट करण्यासाठी ब्रिटिश फौजेतील भिल्ल बटालियन गौताळा डोंगररांगेत वास्तव्याला असताना बांधलेल्या असाव्यात. आज तिथे सिमेंट मध्ये बांधलेल्या पाय-याही दिसतात.बांधून काढलेल्या पाय-यांनंतर खोदीव पाय-यांनी डोंगर चढून जाताना माथ्याला पोहोचण्याआधी डावीकडे एक लहान आकाराचे आणि एक चार खांबांवर तोललेली प्रशस्त अशी लेणी दिसते.
प्रशस्त लेणीपलीकडे तीन मोठी
खांबटाकी आहेत. आज प्रशस्त गुहेत शिवलिंग स्थापलेले असून, एक साधूबाबा
वास्तव्याला असतात. या शिवलिंगाचा काळ फार जुना नसावा. खिडक्या, दारांना
बसवलेल्या सिमेंटच्या चौकटी आणि लोखंडी जाळ्यांमुळे लेण्याला आधुनिक स्वरूप
आले आहे.गडमाथ्यावर पाण्याची अनेक टाकी आणि खांबटाकी सुटी किंवा
समूहांमध्ये खोदलेली आढळतात. येथे इमारतींच्या जोत्यांचे अवशेष दिसतात.
काही ठिकाणी घडीव दगडात बांधलेली तटबंदीचे अवशेष तग धरून उभे असलेले
दिसतात, तर काही ठिकाणी ते काळानुरूप मातीच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. वरील
अवशेषांव्यतिरिक्त उत्तरेला नागद गावाच्या दिशेला उतरणा-या खोदीव पाय-या,
पिराची मजार वगळता इतर काहीही अवशेष दिसत नाहीत. पिराच्या अस्तित्वावरून
गडाला पीरबर्डी किंवा पीर असलेली टेकडी म्हणूनही ओळखले आहे. आज
किल्ल्याच्या निर्मितीविषयी अंदाज बांधणे अवघड आहे.मात्र, अभ्यासक नि.रा.
पाटील तटबंदीच्या बांधकामावरून किल्ल्याची निर्मिती मध्ययुगीन शाही
कालखंडाच्या ही आधीची असावी, असा तर्क आपल्या लेखात मांडतात. तसेच एकंदर
भौगोलिक स्थान व रचनेवरून किल्ल्याची निर्मिती कदाचित टेहळणीसाठी झाली
असावी, असा विचार संयुक्तिक वाटतो. पुरातात्विक संशोधनाअभावी आपल्याला या
किल्ल्याचा इतिहास, त्याचे कार्य आणि तेथे घडून गेलेल्या घटनांविषयी काहीही
पुरावा अजून तरी मिळालेला नाही. मात्र, हा किल्ला आणि असे अनेक इतिहासाचे
शिलेदार आपल्या भेटीची आणि पुढील संशोधनाची आस बाळगत उभे आहेत.
(लेखिका पुरातत्वज्ञ आणि वास्तुसंवर्धनतज्ज्ञ आहेत.)
किल्ल्याची ऊंची : 1600
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : औरंगाबाद श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील डोंगर दर्यात अनेक किल्ले आहेत. त्यातील काही किल्ले काळाच्या ओघात लोकांच्या विस्मरणात गेले. औरंगाबाद जिल्ह्यातील लोकांच्या विस्मरणात गेलेला असाच एक किल्ला म्हणजे लोंझा.
औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे त्याकाळात राजधानीकडे येणार्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण करण्यात आली होती. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे हळूहळू हे किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले.
औरांगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्याच्या दक्षिणेला जे खोर आहे त्याला स्थानिक लोक "राजू खोर" या नावाने ओळखतात. या खोर्यात "महादेव टाक" या नावाचा एक छोटा डोंगर आहे. मुख्य डोंगररांगेपासून एका खिंडीने वेगळ्या झालेल्या या डोंगरावर "लोंझा किल्ला" आजही गतकाळाची साक्ष देत उभा आहे. लोकांच्या विस्मरणात गेलेला हा सुंदर किल्ला शोधून काढण्याचे श्रेय श्री. राजन महाजन व श्री. हेमंत पोखरणकर यांच्याकडे जाते. चाळीसगाव पासून जवळ असलेला लोंझा किल्ला पाहिल्यावर एक वेगळा , सुंदर किल्ला पाहील्याच समाधान मिळत. खाजगी वाहानाने चालीसगावहून अंतूर व लोंझा हे दोनही किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्यावर जाण्यासाठी सिमेंटने बांधलेल्या पायर्यांचा मार्ग आहे. या मार्गाने ५ मिनिटात आपण खिंडीत पोहोचतो. खिंडीतून किल्ल्यावर जातांना डाव्या बाजूला एक शेंदुर लावलेली हनुमानाची मुर्ती पडलेली आहे. खिंडीतून ५ मिनिटात आपण कातळात कोरलेल्या काही पायर्या पायर्या चढून किल्ल्याच्या पश्चिमाभिमुख उध्वस्त प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात.
किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच कातळात कोरलेली गुहा पहायला मिळते. किल्ल्यावरील अवशेष पहाण्यासाठी प्रवेशव्दारतून आत शिरल्यावर प्रथम उजव्या बाजूला जावे. येथे एका खाली एक अशी कातळात कोरलेली दोन मोठी पाण्याची आयताकृती टाकी पहायला मिळतात. या टाक्यांना काटकोनात २ मोठी पाण्याची टाकी आहेत. या टाक्यांच्या वरच्या बाजूला एका खाली एक अशी ३ पाण्याची टाकी आहेत, ही टाकी पाहून खालच्या बाजूस दिसणार्या मोठ्या चौकोनी टाक्याकडे जातांना वाटेत एक सुकलेल टाक व एक खांब टाक दिसते. या टाक्याच्या खालच्या अंगाला किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष व त्यात लपलेला छोटासा चोर दरवाजा आहे. चोर दरवाजा पाहून मोठ्या चौकोनी टाक्याजवळ यावे. किल्ल्याच्या या भागात एकूण १० टाकी आहेत. चौकोनी टाके पाहून डोंगराला वळसा घालून मागच्या बाजूने डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर चढावे. गडमाथ्यावर भिंतीचे अवशेष व घरांचे चौथरे पाहायला मिळतात. या चौथर्यावरच सध्या एक पीराच थडग आहे. त्याच्या पासून काही अंतरावर हनुमानाची मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. गडमाथा पाहून आल्या दिशेला परत न जाता विरुध्द दिशेने (प्रवेशव्दाराच्या दिशेला) खाली उतरावे म्हणजे आपण प्रचेशव्दारा समोरील गुहेपाशी पोहोचतो. वाटेत घरांची २ जोती पाहायला मिळतात.
प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला कातळात कोरलेली ४ खांबी प्रशस्त गुहा (लेणं) पहायला मिळते. या गुहे समोरची कातळ भिंत कोरून त्यातून गुहेचा प्रवेश मार्ग काढलेला आहे. त्यामुळे समोरून केवळ कातळभिंत व त्यातील खाच (दार) दिसते. गुहेत अनेक नविन बदल करण्यात आलेले आहेत. गुहेतील भिंतीवर वीरासनात बसलेल्या हनुमानाची प्रतिमा कोरलेला आहे. गुहेत फरश्या (लाद्या) बसवण्यात आल्या असून आत एक यज्ञकुंडही बांधलेले आहे. गुहेत एका साधूचे वास्तव्य आहे. या गुहेत २५ ते ३० जणांची रहाण्याची सोय आहे. गुहेच्या बाजूला पाण्याचे ५ खांबी पाण्याचे प्रशस्त टाक आहे. या टाक्यातील पाणी बारमही असून ते पिण्यासाठी वापरले जाते.
पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस कातळत कोरलेल पाण्याचं कोरड टाक आहे. त्याच्या जवळच पाण्याच ५ खांबी बुजलेल प्रचंड मोठ टाक (लेणं/गुहा) आहे. त्याची लांबी ९८.५ फूट आहे. हे सर्व पाहून खाली उतरून पिण्याच्या पाण्याच्या टाक्यापाशी यावे. येथून ठळक पायवाटेने उत्तरेकडे (डोंगर उजव्या हाताला व दरी डाव्या बाजूला ठेवत) चालत गेल्यावर कातळात कोरलेल्या पायर्यांचा मार्ग लागतो. हा मार्ग नागद गावाकडे जातो. पूर्वीच्या काळी येथे प्रवेशव्दार असावे. पुढे पायर्या काटकोनात वळतात. साधरणत: ८ पायर्या उतरल्यावर डाव्या बाजूला कातळात कोरलेली शेंदुर लावलेली प्रतिमा पहायला मिळते. त्याचा आकार ओळखण्या पलिकडे गेलेला आहे. या प्रतिमेला वंदन करून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. किल्ला पहाण्यासाठी १ तास लागतो. लोंझा किल्ल्यावरून उत्तरेला अंतुर किल्ला दिसतो.
लोंझा किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
चाळीसगावहून नागद गाव २० किमी अंतरावर आहे. नागदहून बनोटीला जाणार्या रस्त्यावर, नागद पासून १ किमी अंतरावर उजवीकडे (नागदपासून उजव्या बाजूचा दुसरा रस्ता) जाणार्या रस्त्यावर "महादेव टाका" अशी पाटी आहे. येथून लोंझा किल्ला (महादेव टाका डोंगर) ७ किमी अंतरावर आहे. फाटयापासून ५ किमी अंतरावर पांगरा गाव आहे. गावातून उजवीकडे जाणारा रस्ता २ किमीवरील तळ्यापाशी जातो. तळ्याच्या उजव्या बाजूला एक छोटा झाडीने भरलेला डोंगर दिसतो तोच लोंझा किल्ला. किल्ल्याच्या पायथ्या पर्यंत गाडी जाते. (फाट्यापासून किल्ल्या पर्यंतचा रस्ता कच्चा आहे.) पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी सिमेंटने बनवलेल्या पायर्या आहेत. या पायर्यांनी १० मिनीटात आपण गडावर पोहोचतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावरील गुहेत २५ ते ३० जणांची रहाण्याची व्यवस्था होऊ शकते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
किल्ल्यावरील ५ खांबी टाक्यात बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
लोंझा किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुलै ते फेब्रुवारी
सूचना :
१) लोंझा किल्ला आणि लोंझा गाव याच परीसरात वेगवेगळ्या ठिकाणी आहे. लोंझा किल्ला लोकांना "महादेव टाक" या नावानेच माहित आहे. त्यामुळे या परीसरात चौकशी करतांना लोंझा किल्ला न विचारता महादेव टाक कुठे आहे ते विचारावे.
२) खाजगी वहानाने चाळीसगावहून लोंझा किल्ला व अंतुर किल्ला एका दिवसात पहाता येतात.
लोंझा किल्ल्यावरुन अंतुर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१) रस्त्याने :- लोंझा पांगरा मार्गे नागद गाठावे, नागदहून सायगव्हाण मार्गे नागापूर गाठावे. नागापूर-खोलापूर - अंतुर असा कच्चा गाडीरस्ता आहे. यामार्गाने चाळीसगाव ते अंतुर अंतर ८० किमी आहे.
२) चालत :- लोंझा किल्ल्याजवळ तलावाकाठी पांगरा गावाची एक वाडी आहे. या वाडीतून वाटाड्या घेऊन ४ तासात अंतुर किल्ल्यावर जाता येते.
याशिवाय पांगरा - बेलखेडा - मार्गे गोपेवाडी गाठावे. गोपेवाडीच्या वर एक धनगरवाडा आहे. पावसाळा सोडून इतर ॠतुत धनगरवाड्या पर्यंत गाडी जाते. येथून ३ तासात अंतुर गडावर जाता येते.
उंची : १५७५ फुट
श्रेणी : सोपी
औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या सातमाळ डोंगररांगेत अनेक किल्ले आहेत पण दौलताबाद अंतुर यासारखे किल्ले सोडले तर इतर किल्ले तसे अपरीचीत आहे. इतकेच नव्हे तर काळाच्या ओघात काही किल्ले लोकांच्या विस्मरणात देखील गेले आहेत. लोकांच्या विस्मरणात गेलेला असाच एक किल्ला म्हणजे लोंझा किल्ला. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे फारसे कोणी फिरकत नाही. कन्नड तालुक्यात लेणी व पाण्याची टाकी यांनी सजलेला व रचनेच्या बाबतीत जवळच्याच सुतोंडा किल्ल्याशी समानता बाळगुन असलेला हा किल्ला परिसरात महादेव टाका म्हणुन ओळखला जात होता. किल्ला म्हणुन अस्तित्व हरवुन बसलेला व लोकांच्या पुर्णपणे विस्मरणात गेलेला हा किल्ला पुन्हा नव्याने लोकांसमोर आणण्याचे काम श्री. राजन महाजन व श्री. हेमंत पोखरणकर यांनी केले. खाजगी वाहनाने चालीसगावहून सुतोंडा व लोंझा हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहुन अंतुर किल्ल्यावर मुक्कामास जाता येते. लोंझा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला पांगरा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. येथील रस्त्यांची भयानक अवस्था पहाता मुंबई-पुण्याहुन येथे जाताना चाळीसगावमार्गे जाणे हा बऱ्यापैकी पर्याय आहे. चाळीसगाव पांगरा हे अंतर २५ कि.मी.असुन चाळीसगाव-नागद मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर १०० कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-कन्नड-नागद मार्गे पांगरा येथे येण्यास ५ तास लागतात. नागदहून बनोटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नागद पासून १ किमी अंतरावर उजवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महादेव टाका अशी पाटी आहे. या परिसरात लोंझा किल्ला महादेव टाका या नावाने प्रसिद्ध असल्याने लोंझाच्या रस्त्याची चौकशी करताना महादेव टाका असे विचारावे. येथून लोंझा किल्ला ७ किमी अंतरावर आहे. फाटयापासून ५ किमी अंतरावर पांगरा गाव आहे. वाहनांची सोय केवळ पांगरापर्यंत असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास पुढील अंतर पायी कापावे लागते. पांगरा गावातून उजवीकडे जाणारा रस्ता २ कि.मी.वरील तलावाकाठच्या आश्रमाकडे जातो. या रस्त्याने जाताना डाव्या बाजुला एक प्राचीन उध्वस्त शिवमंदिर दिसते. मंदिराचा सभामंडप पुर्णपणे ढासळलेला असुन गर्भगृह कसेबसे उभे आहे. मंदिर ढासळले असले तरी त्याच्या अवशेषावरील कोरीव आवर्जुन पहाण्यासारखे आहे. लोंझा किल्ला मुख्य डोगरापासुन सुटावलेल्या एका उंच टेकडीवर आहे. आश्रमाकडून किल्ल्यावर जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. या वाटेने जाताना पत्र्याच्या निवाऱ्यात एक शिवलिंग व शनीदेवाची मुर्ती पहायला मिळते. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन आश्रमाकडून जाणारी वाट मुख्यतः वापरात आहे. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट आपण चढत असलेल्या वाटेच्या विरुद्ध बाजूस असुन तेथुन ढासळलेल्या दरवाजातून ती गडावर येते. पायऱ्यांच्या वाटेने १० मिनिटात आपण खिंडीत पोहोचतो. येथे वरील बाजुस उध्वस्त तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. पाय-यांची वाट उजवीकडे वळते तिथे एक झिज झालेली शेंदूर फासलेली मारूतीची मूर्ती आहे. येथुन २५-३० पायऱ्या चढून किल्ल्याच्या उध्वस्त प्रवेशव्दारातुन आपण गडप्रवेश करतो. पायथ्यापासून इथवर येण्यासाठी अर्धा तास लागतो. किल्ल्याचे पश्चिमाभिमुख प्रवेशव्दार पुर्णपणे उध्वस्त झालेले असुन त्याचा केवळ तळभाग शिल्लक आहे. समुद्रसपाटीपासून १५७१ फुट उंचीवर असलेला हा गोलाकार किल्ला ८ एकर परिसरावर पसरलेला आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच कातळात दोन दालनात कोरलेली पाणी साठलेली गुहा पहायला मिळते. या गुहेकडून उजव्या बाजूस आल्यावर अजुन एक टाके व त्यापुढे एका खाली एक अशी दोन मोठी पाण्याची टाकी पहायला मिळतात. या टाक्यांच्या वरील बाजुस एका खाली एक अशी ३ पाण्याची टाकी असुन त्यांच्या वरील बाजूस अजुन दोन भली मोठी पाण्याची टाकी आहेत. या सर्व टाक्यांशेजारी त्यांच्यावर झाकण टाकण्यासाठी जमिनीमध्ये खळगे कोरलेले आहेत. तसेच टाक्यात पाणी जमा करण्यासाठी वरील बाजूस चर खोदलेले आहेत. या टाक्यांच्या खालील बाजुस एक चौकोनी सुकलेले टाके दिसते. या टाक्याकडे जातांना वाटेत एक लेणीवजा खांबटाके दिसते. या टाक्याच्या खालील बाजूस काही प्रमाणात तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. किल्ल्याच्या या भागात पहिली पाण्याने भरलेली गुहा सोडल्यास एकुण १० टाकी पहायला मिळतात. चौकोनी टाके पाहून माथ्याला प्रदक्षिणा घालत पुढे गेल्यावर डोंगर उतारावर एका झाडाखाली अजुन एक लेण्यासारखे भलेमोठे खांबटाके पहायला मिळते. डोंगरावरून आलेली माती साठत असल्याने हे टाके बुजत चालले आहे. हे टाके पाहुन झाल्यावर पुढील वाटेने टेकडीच्या माथ्यावर जावे. गडमाथ्यावर भिंतीचे व दोन वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. यातील एका चौथऱ्यावर कबर उभारलेली असुन त्यापासून काही अंतरावर हनुमानाची मुर्ती ठेवलेली आहे. गडमाथा पाहून प्रवेशव्दाराच्या दिशेने खाली उतरताना वाटेत २ घरांची जोती पाहायला मिळतात. प्रवेशव्दाराकडून डावीकडे जाणारी एक मळलेली वाट असुन या वाटेच्या डाव्या बाजूस लोखंडी सरंक्षक कठडे बांधलेले आहेत. या वाटेने पुढे आल्यावर काही अंतरावर उजव्या बाजूस कातळात कोरलेली ४ खांबी प्रशस्त गुहा आहे. या गुहेचा आकार साधारण ४० x ३८ फूट लांबरुंद आणि सहा फूट उंच असा आहे. या गुहेचा मार्ग बनविताना गुहेसमोरचा कातळ आतील बाजूस कोरून त्यातून गुहेची वाट काढलेली आहे. त्यामुळे समोरून केवळ कातळभिंत व त्यातील प्रवेशमार्ग दिसतो. गुहेच्या खिडक्या- दारांना बसवलेल्या सिमेंटच्या चौकटी आणि लोखंडी जाळ्यांमुळे गुहेला आधुनिक स्वरूप आले आहे. गुहेत शिवलिंग स्थापन करून भिंतीवर हनुमान प्रतिमा कोरली आहे तसेच एक होमकुंडही बांधलेले आहे. या गुहेत सध्या एका साधूचे वास्तव्य असुन गुहेत २५ ते ३० जण सहजपणे राहु शकतात. गुहेच्या बाजूला एक मोठे ५ खांबी बारमही पाण्याचे टाके असुन या टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते. या टाक्याच्या वरील बाजूस पाण्याचं अजुन एक कोरड टाक आहे. त्याच्या जवळच १०० फुट लांबीचे ५ खांबी लेणं आहे. लेणी पाहुन कठड्याकडील मूळ वाटेवर परतुन पुढे निघावे. या वाटेने पुढे आल्यावर नागद गावाकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. किल्ल्याचा नागद दरवाजा काळाच्या ओघात नामशेष झाला असला तरी येथील बांधकाम व अवशेष आपल्याला पूर्वीच्या काळी येथे दरवाजा असल्याची जाणीव करून देतात. येथुन काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर वाटेच्या डाव्या बाजूला कातळात झीज झालेली शेंदुर लावलेली मुर्ती पहायला मिळते. येथुन खाली जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन पुढील वाट नागद गावाकडे जाते. येथे आपले किल्ला दर्शन पुर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो. लोंझा किल्ल्यावरून उत्तरेला अंतुर किल्ला दिसतो. किल्ल्याच्या निर्मितीविषयी अंदाज बांधणे कठीण असले तरी एकंदर भौगोलिक स्थान व रचनेवरून तसेच तटबंदीच्या बांधकामावरून किल्ल्याची निर्मिती मध्ययुगीन कालखंडाच्या आधी टेहळणीसाठी झाली असावी. औरंगाबाद जिल्ह्यातील देवगिरी हे यादवांच्या राजधानीचे ठिकाण होते. त्यामुळे यादवकाळात राजधानीकडे येणाऱ्या मार्गांवर टेहळणीसाठी किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. अंतुर हा या परिसरातील एक महत्वाचा किल्ला असल्याने त्याच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या दिशेने जाणा-या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या प्रभावळीत जे किल्ले बांधले गेले त्यातील एक म्हणजे लोंझा किल्ला. ज्येष्ठ लेणी अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांच्या मते ही हिनयान पंथीय बौद्ध लेणी असून ती चौथ्या किंवा पाचव्या शतकात कोरली असावी. बौद्ध धर्माची उतरती कळा व त्यामुळे पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने हि लेणी अर्धवट राहिली असावीत. यावरून या किल्ल्याचा इतिहास चौथ्या शतकापर्यंत जातो. यादवांचा पराभव झाल्यानंतर देवगिरीचे महत्व कमी झाले. त्यामुळे टेहळ्णीसाठी बनवलेल्या किल्ल्यांचे महत्वही कमी झाले व आडमार्गावर असल्यामुळे हळूहळू हे किल्ले लोकांच्या विस्मरणात गेले. हा डोंगरमाथा परिसर महादेव टाका डोंगर म्हणून ओळखला जात असला तरी औरंगाबाद गॅझेटिअरमध्ये या ठिकाणाचा उल्लेख लोंझा नावाने असल्याने या किल्ल्याला लोंझा नाव दिले गेले.
इथून पुढे चालू….
नियोजित पिल्यान परमाने आज आम्हाला ट्रेकचा पहिला टप्पा म्हणजे चाळीसगाव गाठायचं होतं. हा मार्ग नाशिक - मालेगाव मार्गे चाळीसगाव असा आहे. मुंबई - आग्रा हायवेवर लोण्याच्या गोळ्यावरून गाडी चालत असल्याचा भास होत होता. चांदवड गावाच्या बाहेर हायवेलाच हॉटेल भैरवनाथ मध्ये खुमासदार मिसळ,रस्सावडा,कांदाभजी आणि गरमागरम चहा हाणला तेव्हा कुठे आत्मा थंड झाला !!! इंद्राई किल्ल्याजवळच्या वडबारे गावाच्या फाट्यानंतर मुंबई - आग्रा हायवे उताराला लागला आणि त्यानंतर गाडीने उजवीकडे चाळीसगावच्या दिशेने मोर्चा वळवला आणि इथेच लोण्याचा गोळा हा भाजलेल्या पापडात बदलला !!! आपण इतका वेळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होतो ही सुखावणारी जाणीव आता कंबरदुखीमध्ये परिवर्तित होत होती. राष्ट्रीय महामार्ग ते राज्य महामार्ग (???) हा प्रवास विलक्षण तापदायक होता. चाळीसगाव वरून आम्ही अंतुर किल्ल्याच्या जवळ असलेल्या त्यातल्या त्यात मोठया म्हणजे नागद गावाकडे निघालो. आज १५ ऑगस्ट. स्वातंत्र्यदिनाची तयारी अतिशय उत्साहात सगळीकडे सुरु होती. छोटया छोटया गावात वाजणारी स्वातंत्र्यगीते…मस्तपैकी आवरून शाळेत निघालेली लहान लहान मुलं…शाळांची सुरु असलेली सजावट ह्या सगळ्या गोष्टींनी वातावरण भारून टाकलं होतं !!! नागद - सायगव्हाण - औट्रम घाट चढून गौताळा अभयारण्य - नागापूर - खोलापूर व सरतेशेवटी अंतुर असा हा प्रवास आहे. नागद ते अंतुर किल्ला हे अंतर अंदाजे तीस किलोमीटर्स आहे. नागद सायगव्हाण रस्त्यावरून डावीकडे अंतुरचं सुरेख दर्शन झालं. इतक्या लांबूनही त्याचे बुरुज आणि काही अवशेष स्पष्ट दिसत होते. अंतुरच्या डोंगररांगेच्याच खालच्या बाजूला अगदी छोटासा लोंझा किल्लासुद्धा लक्ष वेधून गेला. ऑगस्ट महिना. पावसाने जवळपास दोन आठवडे दडी मारलेली असल्याने हिरव्यागार वातावरणात मोहवून टाकणारा गारवा होता आणि त्या हिरवळीने संपूर्ण प्रदेश खूपच सुंदर दिसत होता. सायगव्हाण नंतर गौताळा अभयारण्यात घेऊन जाणा-या औट्रम घाटाला एकूण २८ वळणं (टर्न्स) आहेत अशी माहिती मिळाली. आता अभयारण्यातूनच रस्ता काढलेला असल्यामुळे आजूबाजूला एखादा प्राणी पक्षी तर सोडाच पण साधी चिमणी सुद्धा दिसली नाही. कारण स्थानिकांना अभयारण्य म्हणजे काय ह्याचं मुळातच गांभीर्य नसल्याने जोरजोरात हॉर्न वाजवण्याबरोबरच कान बधिर होतील इतक्या मोठया आवाजात "ही पोली साजूक तुपातली" "बघतोय रिक्षावाला" वाजत होतं. हे सगळं सहन करून घाटमाथ्यावर पोहोचलो आणि इथे एक चौक लागला. ह्या चौकात वनखात्याची चौकी असून इथून डावीकडे जाणारा (भंगार) रस्ता नागापूर म्हणजेच अंतुर किल्ल्याकडे तर उजवीकडे जाणारा रस्ता कन्नडमार्गे औरंगाबादला जातो.
अंतुरकडे जाताना वाटेत उजवीकडे हा दगडी स्तंभ लागतो. ह्याच्या चारही बाजूंना अंतुर किल्ल्याच्या चारही बाजूस असणा-या महत्वाच्या गावांची नाव त्यांच्या त्यांच्या दिशांप्रमाणे फार्सी भाषेत लिहिलेली आहेत. इथून पुढे गेल्यावर एक मारुतीची मूर्ती आहे. त्याचा फोटो घेता आला नाही.
गाडीरस्ता संपून जिथे अंतुरची पायवाट सुरु होते तिथेच वनखात्याने हा दुसरा "पॅगोडा" उभारला आहे. जेवणासाठी आणि प्रसंगी मुक्कामासाठी कमालीची सुंदर जागा !!!
ह्याच दरवाजात डावीकडे हा झरोका ठेवला आहे. पहिल्या दरवाजातून दुस-या दरवाजाकडे येणारा मार्ग हा ह्याच झरोक्याच्या खालून येत असल्याने शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी ह्या झरोक्याचा वापर केला जायचा असा तज्ञांचं मत आहे.
बाकीचे या ठिकाणी थांबलेले असताना मी एकटाच खाली उतरून आलो आणि खोलापूर गावच्या एका गुराख्याने माझं लक्ष वेधलं. पंचविशीतला तरुण अस्खलित मराठीत कोणाशीतरी फोनवर बोलत होता. त्याचं बोलून झाल्यावर मी त्याला हाक मारली.
"रामराम. कुठून आलात ??"
"हे काय. खोलापूरचे. "
"अच्छा. नाव काय तुझं??"
"शेख लतीफ. मुसलमान आहे मी"
"मग ?? त्याने काय फरक पडतो ??" त्याला मी विचारलं
"तसं नाही. तुम्ही शहराकडची लोकं. मी गावातला मुसलमान आहे म्हणल्यावर माझ्याशी बोलाल का नाही ते माहित नव्हतं !!!"
त्याचं उत्तर विचार करायला भाग पाडणारं होतं. म्हणजे ह्या आधीसुद्धा केवळ धर्मावरून त्याची मदत नाकारल्याचा कटू अनुभव त्याला आला होता !!
"एक काम कर. आम्ही इथे पहिल्यांदाच आलोय. आता तूच आम्हाला सगळा किल्ला दाखव !!!"
क्षणार्धात त्याच्या चेहे-यावरचे भाव बदलले !! कदाचित हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. आमचा हा संवाद सुरु असताना बाकीच्यांनी तटबंदीच्या कडेने गड भटकायला सुरुवात केली होती तर मी एकटाच लतीफशी जास्त वेळ बोलता यावं म्हणून तो दाखवेल तसा किल्ला बघत होतो. हळूहळू त्याने आपल्याकडच्या माहितीचा खजिना उघडायला सुरुवात केली.
"हा जो तलाव दिसतोय ना…तिथे गावात कोणाला जेवण बनवायचं असेल तर ते लोक हव्या असलेल्या भांड्यांची नावं एका कागदावर लिहून तो कागद ह्या तलावात सोडायचे आणि काही मिनिटात त्यांनी कागदावर लिहिलेली भांडी तलावातून वर यायची.त्याच्यात जेवण बनवलं जायचं नंतर नंतर लोकांनी ती वर येणारी भांडी चोरून न्यायला सुरुवात केली. तेव्हापासून अशी भांडी तलावातून वर येणं बंद झालं !!"
स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचा हा एक मोठा फायदा असतो. बाकी काही मदत मिळो अथवा न मिळो… निखळ मनोरंजन करणा-या अशा दंतकथा मात्र निश्चितच ऐकायला मिळतात. पण एक गोष्ट मात्र इथे कटाक्षाने पाळावी. ती म्हणजे ते सांगत असेलेली माहिती कितीही का अविश्वसनीय,पुरावा नसलेली किंवा अशक्य कोटीतली असू दे…त्यांना ती मुक्तपणे सांगू द्यावी. किल्ल्यांचा ऐतिहासिक पुराव्यांद्वारे अभ्यास करणा-यांपैकी ते नसतात. उलट आपण त्यांचे पाहुणे म्हणून उत्साहाने ते आपल्याला त्यांना माहित असलेल्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे मध्येच "ह्या… काहीही काय सांगताय… हे साफ खोटं आहे." वगैरे बोलून त्यांचा हिरमोड करू नये. उलट तुम्हाला योग्य माहिती असेल तर ती त्यांना पटेल अशा भाषेत प्रेमाने समजावून सांगावी म्हणजे सुसंवाद व्यवस्थित साधता येतो.
वर दिलेल्या दरवाजातून आत आल्यावर मागे वळून पाहिलं की दरवाजाची कमानी वास्तू ह्याप्रमाणे दिसते.
पीर (राजवाडा) बघून आम्ही आता परतीचा प्रवास सुरु केला. वरच्या फोटोत दाखवलेल्या तीन दरवाजांच्या तटबंदीतील मधल्या दरवाजातून आपण बाहेर पडलो की पुन्हा आपण अंतुर किल्ल्याच्या मुख्य पठारावर येउन पोहोचतो.
दुपारचे तीन वाजत आले होते. नागापूर पासून लोंझा किल्ल्याला जाण्यासाठी पुन्हा एकदा औट्रम घाटामार्गे (शेख लतीफच्या भाषेत "अक्रम" घाटामार्गे !!!!) आम्ही नागदला निघालो तेव्हा गाडीत वाळवंट पसरलं होतं !! कारण अंतुर किल्ल्यावरून भरून आणलेलं पाणी जेवतानाच संपल्याने सगळ्यांच्याच बाटल्यांमध्ये खडखडाट होता. बाहेर हिरवागार आसमंत असतानाही आम्हाला गाडीत मात्र कंठशोष पडला होता. त्यामुळे नागदला पोहोचेपर्यंत पाण्याच्या किमान २-३ बाटल्या तरी भरणं गरजेचं होतं. काळाची आणि शरीराची गरज ओळखून रस्त्यावरच्या एका विहिरीमध्ये आम्ही पाणी भरायला थांबलो आणि जेव्हा त्या पाण्याचा पहिला घोट घेतला तेव्हा असं लक्षात आलं की आपण बहुदा रेडा धुवायला वापरतात ते पाणी पीत आहोत !!! पाणी कमालीचं जड आणि अत्यंत मचूळ होतं (ह्या ब्लॉगच्या पहिल्या भागातल्या सूचना आठवा !!! ). पण आता दुसरा पर्यायच नव्हता. शेवटी नागदला पोहोचेपर्यंत वेळ मारून न्यावी लागली !! नागद ह्या गावाला "धुळे" हे नाव जास्त शोभलं असतं !! कारण आम्ही गावात पोहोचलो त्यावेळी पावसाळ्यात धुकं असावं तसा प्रचंड धुराळा नागद मध्ये उडाला होता !! त्यामुळे कधी एकदा इथून निघतोय असं झालं होतं. नागदमध्ये मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंक्सची मनसोक्त खरेदी झाली आणि आम्ही आता लोंझा किल्ल्याच्या दिशेने निघालो.
चाळीसगाव वरून नागदला आल्यास मुख्य बाजारपेठेतून डावीकडे जाणारा तर अंतुरच्या म्हणजेच गौताळा अभयारण्य - सायगव्हाणच्या दिशेने आल्यास मुख्य बाजारपेठेतून उजवीकडे जाणारा रस्ता हा बेलखेडा - बनोटी - सोयगाव मार्गे फर्दापूरला जातो. ह्याच रस्त्याने नागद पासून सुमारे एक किलोमीटर गेल्यावर लगेचच रस्त्याच्या उजवीकडे खालील पाटी लावली आहे.
लोंझा किल्ल्याच्या पायथ्याला हा आश्रम असल्याने तिथल्या परिसरात लोंझा किल्ल्याचा डोंगर हा "महादेव टाका" डोंगर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. त्या परिसरात लोंझा किल्ला वगैरे काही माहित नाही. त्यामुळे "इथे किल्ला कुठे आहे" असं विचारल्यास अंतुर किल्ल्याचा पत्ता सांगितला जातो. म्हणून नागद मध्ये लोंझाच्या रस्त्याची चौकशी करताना "महादेव टाका" कुठे आहे असं विचारावं. नागद पासून ही पाटी म्हणजेच लोंझा किल्ल्याचा फाटा एक किलोमीटर आणि ह्या पाटीपासून किल्ल्याचा पायथा सात किलोमीटर असं नागद ते लोंझा एकूण आठ किलोमीटर अंतर आहे.
लोंझा किल्ल्याची उंची आणि गडावरील अवशेष बघता हा काही लढाऊ किल्ला नाही हे लगेचच लक्षात येतं. पण लोंझाच्या आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने ह्या भागात काही स्थानिक वाटा आहेत. आपल्या सोयीसाठी आपण त्यांना घाटमार्ग म्हणू शकतो. अंतुर हा त्या परिसरातील एक महत्वाचा किल्ला !! त्यामुळे अंतुरच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या दिशेने जाणा-या ह्या घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या प्रभावळीत जे किल्ले बांधले गेले त्यातील एक म्हणजे लोंझा किल्ला !! त्यामुळे उंची लहान आणि कार्य महान असंच लोंझाच्या बाबतीत म्हणता येईल. पण लोंझा किल्ल्यावर भटकंती करण्याआधी हा नवाकोरा किल्ला कसा सापडला ह्याची सुरस कथा आधी आपण ऐकू !!
एक ठाण्याचा रहिवासी आणि एक नाशिकचा रहिवासी असे दोन "चक्रम" लोक !! नावात आणि रक्तातच चक्रमपणा असल्याने जगापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि त्याच्याच जोडीला सखोल अभ्यासाची साथ लाभलेले दोन अवलिये !! झालं असं की अंतुर किल्ल्याचा "गुगल अर्थ" वरून शोध घेताना त्याच्या शेजारच्या छोटयाश्या डोंगरावर काहीतरी "अर्थ" पूर्ण असल्याचा साक्षात्कार या दोघांना झाला. गुगल अर्थ वरून त्या डोंगरावर झूम करून पाहिल्यावर मोठया आकाराचे भरपूर चौकोनी खड्डे ह्या दोघांना दिसले. पण गुगल अर्थच्या झूम करण्याच्या मर्यादा आडव्या आल्या आणि इथेच त्या दोघांचं कुतूहल जागं झालं. पण पुराव्याशिवाय काहीही जाहीर करता येणार नव्हतं. शेवटी आपण जाउन काय आहे ते बघून येऊ हा निर्णय झाला आणि ह्या डोंगराचा माग काढत हे दोघं स्थानिक लोकांच्या "महादेव टाका" ह्या ठिकाणी पोहोचले आणि इथेच महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या यादीत अजून एक खजिना दाखल झाला…किल्ले लोंझा !!! माध्यमांनीही ह्या आगळ्यावेगळ्या शोधकथेची दाखल घेतली आणि त्याला दणक्यात प्रसिद्धी दिली !!!
हे अचाट काम साध्य करणारे आणि महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्राला या शोधाच्या माध्यमातून एक नवीन ठेवा मिळवून देणारे हे दोन मावळे म्हणजेच राजन महाजन आणि हेमंत पोखरणकर !!! पुढे ह्या दोघांनी पुण्याच्या "भारत इतिहास संशोधक मंडळ" येथे आणि मुंबईच्या "गिरिमित्र" संमेलनात आपल्या शोधाविषयी सादरीकरण देऊन आणि एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये आपला शोधनिबंध प्रसिद्ध करून लोंझा किल्याला अधिकृत मान्यता मिळवून दिली.
आमच्या ट्रेकचा खरा "USP" म्हणजे लोंझा किल्लाच होता. ह्याचं कारण त्या शोधमोहिमेतला एक शिलेदार म्हणजेच साक्षात हेमंत आमच्याबरोबर होता. नागदहून अर्ध्या तासात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याला दाखल झालो तेव्हा संध्याकाळचे रंग आकाशाच्या कॅनव्हासवर पसरायला सुरुवात झाली होती. लोंझाच्या पायथ्याला एक तलाव असून त्याच्याच मागे झाडीमध्ये वरच्या पाटीत दर्शवलेला आश्रम आहे.
लोंझा किल्ल्याच्या शेवटच्या पाय-या. ह्या संपल्या की किल्ल्याचा पूर्णपणे भग्न झालेला दरवाजा आहे
लोंझा किल्ल्यावर प्रवेश करताच हे सुंदर खोदीव टाकं दिसलं.
सहा वाजत आले होते. लोंझा किल्लाधिपति हेमंत बरोबर असल्याने किल्ल्याचे अवशेष सापडायला काहीही कष्ट घ्यावे लागले नाहीत. किल्ला उतरताना आम्ही पश्चिमाभिमुख असल्याने २०१४ च्या स्वातंत्र्यदिनाची सांजवेळ आमच्यासमोरच सजत होती…आमच्या डोळ्यात भरत होती. त्या कातरवेळेचे बदलत जाणारे रंग बघणे हा एक अविस्मरणीय सोहळा होता. भान हरपून सहा मनांनी आपपल्या शरीरांना तिथेच रोखलं. प्रत्येक क्षणागणिक ते पश्चिमरंग गहिरे होत होते !!! ती वेळ टाळून पुढे जाणं शक्यच नव्हतं. निसर्गाने आपण किती श्रेष्ठ किमयागार आहोत ह्याची सरणा-या प्रत्येक मिनिटाबरोबर जाणीव करून द्यायला सुरुवात केली तेव्हा अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारं… सीमारेषेवरच्या जवानांच्या आत्माहुतीचे स्मरण करून देऊन आपल्या नागरिकत्वाच्या कर्तव्यांची कठोर जाणीव करून देणारं…. आज त्यांच्यामुळे आपण उद्याचा दिवस बघू शकतोय ही भावना मनात चेतवणारं आणि गानकोकिळेने आपल्या स्वर्गीय आवाजात अजरामर केलेलं "ए मेरे वतन के लोगो" माऊथ ऑर्गनवर वाजत होतं !!! सहा डोंगरवेडे आपलं अस्तित्व विसरून त्या अपूर्व सांजेचा एक एक क्षण जगत होते… आपल्या मनात राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग जागवत होते !!! आज का कुणास ठाऊक….तो लोहगोलही निरोप घ्यायला जरासा वेळच घेतोय असं वाटत होतं. कारण "ए मेरे वतन के लोगो" सलग दुस-यांदा वाजत होतं तरीही आसमंत भारावलेलाच होता !!!
लोंझा किल्ला आम्ही उतरलो तेव्हा ब-यापैकी अंधारून आलं होतं. गडावर पायथ्याच्या पांगरा गावातील तीन मुलं आली होती. किल्ला उतरताना आपोआपच त्यांच्याशी ओळख निघाली आणि "हा किल्ला फक्त महादेव टाका डोंगर नसून एक ऐतिहासिक किल्ला सुद्धा आहे आणि इथे येणा-या ट्रेकर्सना हा किल्ला कसा दाखवावा" ह्या विषयावर एक छोटंसं ज्ञानदानसत्र सुद्धा घेण्यात आलं. लोंझा किल्ला अगदी नव्यानेच प्रकाशात आल्याने त्याला भेट देणा-या काही मोजक्या गिर्यारोह्कांपैकी आम्ही एक होतो. आमच्या नंतर हा ब्लॉग वाचून जेव्हा आपल्यासारखे रसिक वाचक आणि दुर्गप्रेमी त्या सुंदर किल्ल्याला भेट द्यायला जातील तेव्हा स्थानिकांकडून त्यांना पूर्ण सहकार्य मिळेल ह्याची केलेली ती छोटीशी तजवीज होती.
Lonza, a small and beautiful fort from Aurangabad region. Lonza was our second fort in the list of five forts that we had planned to visit in the Aurangabad trek tour. Earlier in the day, we had been to “Antur fort” (Read the blog here) and now we were at Lonza fort by 1 PM. Located in beautiful area and surrounded by forest, this fort has many things to offer to an offbeat trekker, rock cut steps,cave, water cisterns, view of jungle and all in a short hike of 20 minutes from base to top. The fort is part of important series of forts who govern ancient trade route and modern day ghat route Autram ghat.



















सकाळी सकाळी जाग आली ती मंदिरात पुजारींनी केलेल्या शंखनादाने वाह.
दिवसाची सुरूवातच चांगली झाली. बनोटी गावच्या वेशीवर हिवरा नदीच्या काठावर हे सुंदर अमृतेश्वर मंदिर. सकाळच्या त्या वातावरणात तो शांत मंदिर परिसर मला तर चांगलाच भावला.
मंदिराजवळचे पाण्याचे कुंड. सर्व सोपस्कार आटोपून नाश्ता करायला शिरसाठांच्या खानावळीत गेलो, गरमागरम स्वादिष्ट पोहे पोटभर खाऊन झाल्यावर दुपारच्या १ वाजेपर्यंत जेवणाला येतो असे सांगून, पुढे अर्थातच किल्ले सुतोंडा आमची वाट पहात होता. सुतोंडासाठी बनोटीहून ३ ते ४ किमी अतंरावर असलेल्या पायथ्याच्या नायगाव या गावात जावे लागते. बनोटीतून जाणारा वाडी नायगाव रस्त्याचे काम सुरू असल्याकारणाने गाडी गावातच उभी करून शेतातल्या मधल्या रस्त्याने पायी निघालो.
मातीच्या कच्चा रस्ता आजुबाजूला शेतजमीन आणि केळीच्या बागा. गावाच्या अलीकडेच मारूतीचा पार.
तासाभरात नायगावात पोहचतो तर लगेच समोरून भोला सोनावणेचा फोन, त्याला निघताना सांगितले होते त्या प्रमाणे तो आमच्या सोबत किल्ला दाखवायला येणार होता. गावात शिरल्यावर भोलाशी भेट झाली. पाणी पिऊन किल्ल्याच्या दिशेने निघालो.
पुढे उजवीकडे जाताना काही पीर थडगी, कमानवजा ईमारत.
तसेच पाण्याच्या टाक्यांची मालिका.
काही कोरड्या तर काही काठोकाठ भरलेल्या.
आठ खाबांचे खांब टाके.
पुढे सामोरे आले हे तुटलेले खांब असलेले हे स्वच्छ आणि नितळ पाण्याचे टाके
इथे तर बराच वेळ रेंगाळलो पुन्हा कधी तरी याच जागी नक्कीच तंबू ठोकून मुक्काम करू असे ठरवले. सोबत आणलेला सुका खाऊ फस्त करून किल्ल्याच मुख्य आकर्षण असलेल्या भुयारी दरवाजाकडे निघालो.
खऱच त्या दुर्ग निर्मात्याचे कौशल्य मानावे लागेल, कातळ फोडून तयार केलेला हा दरवाजा तर लाजवाब. वर तटबंदीत शरभ शिल्प दिसते.
पुन्हा आल्यामार्गे उतरायला सुरूवात केली थोडे खाली आल्यावर भोलाने उजवीकडे वळायला सांगितले, हिच काट्याकुट्यातली, घसरडी वाट दहा मिनिटात जोगणमाईच्या लेण्यापाशी घेऊन गेली. आतमध्ये बाळाला मांडीवर घेतलेली स्त्रीची मुर्ती आहे.
लेणीची अवस्था फारच वाईट आजुबाजूला वाढलेली झाडी, आत वटवाघळांचे साम्राज्य .जोगणमाईच्या लेण्यापासून पुढे आणखी एक लेण आहे.
त्यात हे दर्शनी खांब चांगलेच नजरेत भरतात, पण या लेणीतही प्रचंड अस्ताव्यस्तता. खरोखऱच एवढा सुंदर किल्ला तेवढीच दुर्लक्षित ही लेणी. वेळ पटापट जात होता. खाली उतरून नायगावातली झाडाखाली असलेली विष्णुमुर्ती? पाहिली.
भोलाचे आभारप्रदर्शन करून, भर उन्हात ऑक्टोबर हिटचा तडका जाणवला, घामाने चिंब भिजून पुन्हा पायी पायी त्याच वाटेने बनोटीत आलो. दुपारचे दोन वाजले होते ठरल्यावेळेनुसार एक तास उशीर शिरसाट आमची वाटच पहात होते. वरण भात, कोबीची भाजी चपाती दही आणि शेवटी ताक असे दुपारचे मस्त जेवण करून अगत्यशिल शिरसाठांचा निरोप घेण्याची वेळ आली. नियोजनानुसार सायंकाळच्या आत आम्हाला अंतुर किल्ल्यावर पोहचायचे होते. आमचा आजचा मार्ग.
भर दुपारी तीन वाजेच्या सुमारास आम्ही बनोटी सोडले. गाडीचा बॉयलर झाला होता. ए सी ची पॉवर चांगलीच आजमावता आली. त्यात बनोटी ते नागद रस्ता तर कहरच, गाडीचा खुळखुळा होतोय की काय अशी शंका मला यायला लागली. अक्षरश: एक ते दिड तास नागद पोहचायला लागले. नागद ते सायगव्हाण तो रस्ता पण यथातथाच,चांगल्या रस्त्याची कुठे आशाच नव्हती. या रस्त्याच्या डावीकडे गौताळा अभयारण्याची अजिंठा डोंगररांग समांतर धावत होती. डावीकडे मुख्य रांगेत अंतुर सहज ओळखता आला. पण तिथे आम्ही या रांगेतला औट्रम घाट चढून नागापूर खोलापूर मार्गे जाणार होतो.
सायगव्हाणहून डावीकडे औट्रम घाटाकडे वळून अधिकृतरित्या गौताळा अभयारण्यात प्रवेश केला.
१०-१२ किमी चा बरेच वळणावळणाचा तो घाट, समोरून गाववाले बाईकवाले तर थेट अंगावर गाडी घालत, काही महाभाग तर बायका पोरांसोबत इंजिन बंद करून तो तीव्र उताराच घाट सुसाट उतरत होते. शेवटी शेवटी तर खऱ सांगतो, मलाच गाडी चालवत चक्कर येईल की काय असे वाटत होते.
घाट चढून आल्यावर हि वन विभागाची पाटी.
अलीकडे गाडी थांबवून आम्ही पण फोटू काढला.
अभयारण्यातले जंगल बर्यापैकी टिकून आहे, डावीकडे सीताखोरी धबधब्याचा पॉईंट होता, उद्या येताना पाहू असे म्हणून पुढे निघालो. वळणदार जंगलातल्या रस्त्यानंतर काही वेळातच पठारावर छोटी खेडी पार करत डावीकडे अंतुर किल्ल्याची पाटी दिसली. पाटीचा रंग फिक्कट असल्याकारणाने फोटो नाही घेता आला. आता मात्र कच्चा रस्ता लागला.
गौताळाचा स्वामी किल्ले अंतुर
घड्याळात पाहिले तर साडेपाच वाजले होते. २-३ किमी अंतरावर नागापूर हे छोटेखानी खेडं लागल. परत तो ओबडधोबड खरबडीत कच्चा रस्ता पार करत हळुहळु पुढे जातोच तर एक पाण्याचा एक ओढा सामोरा आला. आता मात्र खरी पंचाईत झाली. आधीच हा मातीचा कच्चा रस्ता त्यात मध्ये हा प्रकार.
सायंकाळ होत आलेली मुक्कामाला काहीही करून अंतुर गाठायचाच होता. मागे राहिलेले नागापूर गावातही मुक्कामाची काहिच सोय नाही. बरं इथे या अश्या अरूंद रस्त्यात गाडी ठेवणार तरी कुठे. बरं गाडी पाण्यात घातली समजा फसली तर काय मदत आख्खी रात्र इथेच काढावी लागेल. मला तर दुरदुर पर्यंत अंतुर कुठेच दिसत नव्हता. एक वेगळेच निराशेचे मानसिक मळभ माझ्यावर दाटून आले. तो पर्यंतअंकल लागलीच गाडीतून उतरून एक काठी सोबत घेऊन त्या पाण्यातून सरळ चालत गेले. अंकल पलीकडे गेल्यावर मला जरा हायसे वाटले. ते मला म्हणाले, " कुछ नही है जादा डीप नही है!’’
मी : “ अंकल, नीचे का रस्ता कैसा है ? ’’
(कारण पाण्याखाली चिख्खल, दगड धोंडे असतील तर गाडी कशी पास होईल.)
अंकल: “ कुछ नही होगा, मै खुद पानीमे चलके आया से आया हू ! जादा सोचो मत, तुम गाडी निकाल पाओगे!’’
खऱच अंकलचे बोल ऐकून मला जरा बरे वाटले, एव्हाना मिलिंद पण त्या ओढ्यातून पलीकडे आरामात चालत गेला. विवेक पण गाडीच्या बाहेर ओढ्याच्या सुरूवातीला उभा होता.
चला जे होईल ते चांगलेच होईल, असे मनाशी बोलत. मी एकटाच गाडीत बसलो. किंचित काचा खाली घेतल्या. पहिल्या गिअरवर गाडी रेस करत डायरेक्ट पाण्यात घालून, प्रचंड फवारा उडवून गाडी पलीकडे नेली.
आधीच रस्त्याची कृपा त्यात गाडी फर्स्ट- सेंकड करत बरीच गरम झालेली. थोडेफार पाणी बोनट च्या आत गेले असनार, गाडीतून वाफा यायला लागल्या. थोडा वेळ व्यवस्थित सर्व तपासून पुढच्या मार्गाला लागलो. आता पूर्ण रस्ता कच्चा आणि विरळ जंगलातून होता. एके ठिकाणी भला मोठा चढ आणि मध्ये फक्त दगडी, रस्ता? होता की काय हि शंका. लगेच बाकीच्यांना उतरून गाडीच्या बॉटम चा अंदाज घेत हळूच गाडी वर घेतली. बराच वेळ झाला तरी किल्ल्याचे दर्शन काही होत नव्हते. सुर्य पश्चिमेकडे झुकला होता. डोंगराला वळसा घालून डावीकडे वळालो तेव्हा उजवीकडे दरी आणि समोर दुरवर आमचा आजचा अंतुर दिसला.
हळूहळू वाट थोडी चढणीला लागून पुढे सरकत होती. सावकाश गाडी हाकत एकदाचे वनविभागाच्या चौकीपाशी पोहचलो. नीट निरखुन पाहिले तर पुढे अगदी किल्ल्याजवळ दुसरी एक चौकी होती. मग काय तिथपर्यंत गाडी नेली. एव्हाना सुर्यास्त झाला होता.
(फोटोत गाडी उभी केली त्या ठिकाणाहून उजवीकडे अंतुर किल्ल्याचा बुरूज स्पष्ट दिसतोय.)
गाडी व्यवस्थित उभी करून, मुक्कामाचा लवाजमा घेऊन निघालो. संधी प्रकाशात पटापट क्रॉंक्रिटच्या वाटेने पायरा चढून गडाचे बुलंद दरवाजे पार करून २० मिनिटात गडावर प्रवेश केला. वर आल्यावर देवडी दिसली. पुढे जाताच तलाव त्यालागूनच असलेला दर्गा दिसला. दर्गात जाऊन पाहिले तर नुकतेच रंगकाम केलेले असल्याकारणाने इतर कचरा पडलेला होता. त्यामुळे दर्ग्यात मुक्काम शक्य नव्हता. मग आता अंधुक प्रकाशात मुक्कामी जागा शोधणे अवघडच, बरं परत मागे येऊन देवडीत मुक्काम करावा तर पिण्याचे पाणी जवळ नाही. तलावाचे पाणी तर पिण्यासाठी अशक्यच. त्यात मग ओंकारला फोन करून चर्चा केली, त्याने कड्यावरची पाण्याच्या टाक्याजवळची जागा सुचवली. त्यानुसार दर्गा आणि उजवीकडील बाजूची इमारत या मधून सरळ जात. थोडे कड्याच्या दिशेने खाली उतरलो, पुढे वळून थेट पाण्याच्या टाक्याजवळच आलो. कड्याची तटबंदी आणि टाके यामधल्या मोकळ्या मस्त जागेवर तंबू ठोकला.
आत्ता या क्षणी तरी सर्व चिंता मिटली होती, दिवसभराची दगदग आणि ड्रायव्हिंग त्यामुळे आलेला क्षीण त्यावेळी मस्तपैकी तयार केलेल्या मनच्यॉव सुप मुळे कुठच्या कुठे गेला.
तंबू ची जागा खुपच रमनीय होती, जवळच टाक्यातले पिण्यायोग्य पाणी, बाजूलाच तटबंदी सारखे संरक्षक कठडे. पलीकडे औट्रम घाटाच्या बाजूची दरी आणि दुरवर खाली उद्याचा लोंझा किल्ला. शेफ असलेल्या विवेक ने तर आज शाही मेनू तयार केला होता. ‘दावत- ए- अंतुर’ - व्हेज पुलाव, बटर पनीर माखनवाला, लोणचा, मसालापापड साथीला ग्रीन सलाड खऱच जेवण करून तृप्त झालो. सर्व आवराआवरी करून तंबू जवळ त्या अगणित तारांच्या नभांगणाखाली मनसोक्त गप्पा हाणत बसलो, आत्तापर्यंतचे दोन दिवस खुपच मजेशीर गेले होते. त्या पूर्ण किल्ल्यावर फक्त आमची दुर्गवेड्यांची चौकडी. जुन्या ट्रेकचे किस्से अंकलचे हिमालयातले अनुभव, काही पुढच्या ट्रेकची प्लानिंग पहाता पहाता रात्रीचे साडेअकरा होऊन गेले. आता झोपायलाच हवे, उद्या सकाळी लवकर उठून पूर्ण किल्ला पाहून आल्यावाटेने परत खाली उतरून उद्या लोंझा करून चाळीसगाव मार्गे कल्याण परत हा देखील बराच लांबचा पल्ला होता. स्लीपिंग ब्याग मध्ये शिरल्यावर लगेच झोप लागली.
सकाळी अंकलने दिलेल्या पहिल्या हाकेलाच उठलो.तंबु बाहेर येतो तर नुकतेच तांबड फुटत होत. ट्रेकची सकाळ त्यात मुक्काम एखाद्या किल्ल्यावर अथवा डोंगरावर असेल तर विचारायलाच नको. आदल्या दिवशी केलेले सारे श्रम विसरून एका नव्या उमेदीने आपण ताजे तवाने होतोच होतो. अंतुरवरची हि सकाळ पण अशीच प्रसन्न. मग काय सकाळच्या वातावरणातच किल्ला पहायला निघालो.
चौकोनी बुरूजावरून सुर्योदय पाहिला.
इथुन बरासचा किल्ला पूर्ण टप्यात नजरेत येतो.
तलावाजवळच्या भल्या मोठ्या ईमारतीच्या भिंतीवर पिंपळाच्या झाडाने आपले मुळ घट्ट रोवले होते.
छोटी मशिदीसारखी दिसनारी गोल घुमट वास्तु.
पुढे गेल्यावर ही महिरपी तटबंदी.
फोटो काढत असताना अचानक मिलिंदचा एस एल आर क्यामेरा एरर दाखवायला लागला. काहीतरी फोकस लेन्स सेन्सर ची गडबड होती. पुढे त्याची क्यामेराशी खटपट सुरू झाली बरेच अवशेषांचे फोटो आता घेता येणार नव्हते सहाजिकच निराश व्हायला झाले. मग काय कठिण समयी मोबाईल कामी येतो. शक्य तितके फोटो मोबाईल मधून घेतले. पुढे किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या बुरूजाकडे निघालो.
वाटेतली हि भली मोठी तटबंदी.
तटबंदी अलीकडे पहारेकराची देवडी
पलीकडे गैबन शा बाबा चा दर्गा.
शेवटी मोबाईलला मर्यादा आली, बॉटरी लॉ चा अलार्म. बुरूजाकडचे फोटो काही घेता आले नाही. बरेच अवशेष संपन्न असा सुंदर किल्ला पहाताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही. सुर्यदेव चांगलेच वर आले होते.
दिवसभराचा नियोजीत कार्यक्रम आठवत माघारी तंबू जवळ आलो. सर्वात पहिले काम मोबाईल पावर सेट मध्ये चार्जिंगला लावला. कालच्या संधीप्रकाशात येताना दरवाजाचे फोटो घेतले नव्हते. सकाळचा पोटभर नाश्ता करून सामानांची आवरा आवरी करून निघालो.
किल्ला सोडताना खुपच जीवावर येत होत. अस वाटत होते थांबावे इथेच अजुन थोडा वेळ या रमनीय किल्ल्यासोबत घालवावा. पण मग लोंझा आणि पुढचे सगळा प्लान विस्कटणार. पुन्हा दोन दिवस पुर्ण वेळ काढुन येणारच असा मनोमन ठरवुन निघालो.
हिच ती देवडी
पुढे फार्सी शिलालेख असलेला हा दरवाजा.
हा दुसरा बुलंद दरवाजा
जंग्या आणि शिल्प असलेला हा पहिला दरवाजा.
पंधरा मिनिटात गाडी जवळ पोहचलो तर सव्वादहा वाजून गेले होते. पुन्हा कसरत करून आल्यामार्गे नागद पर्यंत जाणे भागच होते.
आमचा आजचा मार्ग :
सावकाश गतीने दगडधोंडे, पाण्याचा ओढा परत सर्व सोपस्कार पार पाडून पाऊण तासात चाळीसगाव सिल्लोड रस्त्यावर आलो. अभयारण्यात घाट सुरू होण्याआधी वन विभागाच्या पॉईंट अलीकडे गाडी कडेला उभी केली आणि उजवीकडच्या पायवाटेने सीताखोरी धबधब्याकडे निघालो.
दोन तीनशे फुट सरळसोट खाली पडनारे पाणी याचे पावसाळ्यात रूप भलतेच महाकाय असनार यात शंकाच नाही. गौताळा वन विभागाने कडेला रेलिंग उभारलेले आहेत वाटेत जाणारे बरेच पर्यटक येथे थांबतात. औट्रम घाट उतरून थेट नागदला दुपारच्या जेवणासाठी थांबलो. ऐन दुपारच्यावेळी पण साधे का होईना जेवण मिळेल असे काहीच आमच्या नजरेस पडले नाही. शेवटी पुढचा पल्ला नजरेसमोर ठेऊन भुकेचा अग्नी शांत करणे गरजेचे होते. दुधाची तहान ताकावर, मग काय समोर वडापाव आणि भजीला पर्याय नव्हता. अर्ध्यातासात तिथुन लोंझा किल्ला म्हणजेच स्थानिक समजतात तो ‘महादेव टाका’ ची चौकशी करून मुख्य रस्त्याला लागलो. नागदपासुन बनोटीच्या दिशेने दिड एक किमी वर उजवीकडच्या शेतातल्या कच्च्या रस्त्याने पांगरा वस्ती अलीकडे गाडी लावली. भर दुपारी ऑक्टोबर हिटमध्ये छोटेखानी लोंझा चांगलाच घाम काढणार याचा अंदाज होताच. राजन महाजन आणि आमचे मायबोलीकर मित्र हेंमत पोखरणकर यांनी हा किल्ला प्रकाशझोतात आणला. या किल्ल्याचे भौगोलिक स्थान हे अंतुर किल्ल्याच्या दक्षिण खोर्यात येते. गौताळा अंजिठाच्या मुख्य रांगेपासून हा सुटावलेला ऊंचीने छोटासा किल्ला. पण अंतुर सारख्या मोठ्या आणि महत्वाच्या किल्ल्यावर जाणार्या मार्गावर टेहळणीसाठी नक्कीच उपयुक्त.
अगदीच सांगायचे झालेच तर आहुपे घाटावरून गोरख मच्छिंद्र जसे दिसतात अगदी तसाच लोंझा अंतुर किल्ल्याहून दिसतो. फक्त पाण्याच्या बाटल्या आणि सुका खाऊ सोबत घेऊन निघालो.
खिंडीच्या दिशेने प्रशस्त पायवाटेने चढाईस सुरूवात केली. आजुबाजूचे जंगल विरळ असल्याने ऊन चांगलेच शेकत होते.
गुहेत मौनी बाबांचे वास्तव्य आहे. आजुबाजूची बरिच मंडळींची त्या निमित्ताने येथे वर्दळ असते.
पुढे उजवीकडे पाण्याची काही टाकी आहेत.
पण गुहेजवळचे खांब टाक्यातले पाणी मात्र चवीला अप्रतिम असेच.
उजव्या बाजूनेच वर चढून गेलो माथ्यावरून कालचा आमचा सोबती अंतुर दिसला. वरती एक चौथरा, मारूतीची मुर्ती आणि पीर. परत गुहेजवळ येऊन पलीकडच्या दिशेला पायरा उतरून गेलो. वाटेतली कातळाकोरीव देवी ? मुर्ती दिसली.
परत टाक्यापाशी येऊन झाडाखाली विसावा घेतला. या मोहिमेतला शेवटचा किल्ला पण मनाला चांगलाच तजेला दिला. खाली येईपर्यंत तीन वाजून गेले होते.
किल्ल्याच्या पायथ्याला असलेला तलावाच्या पार्श्वभूमीवर अंतुर किल्ला सहाजिकच एक फोटू घेतला.
डावीकडून : अस्मादिक, मिलिंद, विवेक आणि नारायण अंकल
अतिशय सुंदर किल्ल्यांच्या या गौताळा मोहिमेत, सर्वात मोठा धसका घेतला असेल तर तो रस्त्यांचा त्यांच्या दर्जाबद्दल लावू तेवढी विशेषण कमी पडावी असे हे रस्ते. एकीकडे विकासाच्या 2G 3G च्या जमान्यात मोबाईलला रेंज सगळीकडे पण चांगले रस्ते आणि स्वच्छतेचा बोलबालाच.
या सर्व बाबींवर मात करून आम्हाला इच्छित स्थळी सुखरूपपणे पोहचवण्यात काहीही कुरबुर न करता आमची साथ दिल्याबद्दल गाडीला मानवंदना द्यायलाच हवी.
अशीच तुझी साथ लाभो आणि सह्ययात्रा घडतच राहो !
पुढे चाळीसगावमार्गे मालेगावहून आग्रा रोड पकडला. चार दिवस ओबडधोबड जमिनीवर झोपलेल्या माणसाला नंतर डनलॉपच्या गादिवर झोपल्यावर जसे वाटेल तसेच बहुतेक गाडीला आणि आम्हाला वाटले. पुढे नाशिकला आडगाव नाक्यावर चांगले शाकाहरी जेवण करून रात्री साडेबाराच्या सुमारास घरी पोहचलो. ट्रीप मीटर रिडींग पाहिली तर ९८८ किमी.




































































































































No comments:
Post a Comment