Tuesday, August 10, 2021

औरंगाबाद बौद्ध लेणी

 सफर औरंगाबाद लेणीची...
ना होकर भी तुम मौजूद हो मुझमें, 
क्या खूब तुम्हारा वजूद है मुझमें।
इस तरह हम सुकून को महफूज कर लेते हैं, 
जब भी तन्हा होते हैं तुम्हे महसूस कर लेते हैं।

औरंगाबाद लेणी 
लेणी क्रमांक 7

मार राजा ' तथागत ' गेली कित्येक वर्ष तपश्चर्या करीत असल्याने काळजीत होता. अग्नी, वर्षा यांचा मारा करूनही तसूभर फरक पडत नव्हता. सर्व उपाय संपल्यावर शेवटी मार कन्या यांनी वडिलांची विवंचना जाणली आणि आम्ही हे तपोभांग करू. असा निर्धार करून त्या जंगलाकडे निघाल्या. पुरुषी स्वभावाची चांगलीच ओळख त्यांना होती. पण तथागत ओळखणे हे सहज सुलभ नव्हते आणि नाहीही. त्यातील एक नृतिका तथागताच्या समोर आपले कौशल्य पणाला लावू लागली. बाकीच्या सहा जनी विविध वाद्य वाजवून साथ द्यायला लागली. परंतु हा प्रयोगही कुचकामी ठरला. 
मित्र-मैत्रिणींनो,
ही नर्तिका अंगठ्यावर नृत्य करायची. अगदी ती अंगठ्यावर उभे राहण्याच्या तयारी असलेली कोरण्यात कलाकाराचे कसब पाहण्यासारखे आहे. ज्या पायावर जोर किंवा दबाव जास्त आहे. त्या मांडीची रचना आणि जो पाय तितका घेऊन अंगठ्यावर उभारण्याच्या तयारीत आहे. त्या पायाची मांडी थोडी विस्तृत झालेली दाखविण्यात कलाकार यशस्वी झालेला आहे. वाद्य वाजविणाऱ्या मुली यांच्या जवळ असलेली बासरी, टाळ, मृदंग हे सर्व पाहता. यांच्यातील कला नैपुण्य डोळ्यात साठवणे हा अनुभव काही वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा असतो. समोरील पॅनल वर मार राजा पत्नीसह असून दोघांच्या मध्ये तथागताची भव्य मूर्ती आहे. महत्वाचे म्हणजे अजिंठा ते वेरूळ या शिल्प निर्मितीत व्हाया औरंगाबाद लेणी असा प्रवास आहे. त्या मुळे औरंगाबाद लेणी हा महत्त्वाचा टप्पा आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे औरंगाबाद मध्ये वास्तव्य करून असणाऱ्या कित्येक स्थानिक लोकांना ही लेणी अद्याप माहिती नाही. मी जेव्हा या बद्दल बोलतो तेव्हा मला म्हणतात, ती लेणी आम्हाला दाखवाल का. एव्हढेच नसून विदेशातून येणारे पर्यटक गाईडला जेव्हा वेरूळ - अजिंठा पाहून झाल्यावर ती मार कन्या कुठे आहे. असे विचारतात तेव्हा आश्चर्याने गाईड त्यांच्याकडे पहात विचारतो की, हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा विदेशी पर्यटक म्हणतात, आम्ही हे सर्व वाचून आलो आहोत. फक्त आपण ती मूर्ती कधी दाखवणार याची वाट पाहत होतो. खरच सांगतो आपल्या एव्हढे करंटे आपणच आहोत...
बहुत काय लिहणे...
दीपावली सुट्टीत कुठे फिरण्याचा मानस असेल तर...
चला औरंगाबादला...
आधी मराठवाडा तर नीट पाहून घ्या...
संत, तंत आणि पंत सर्व आमच्याकडे आहे...
आणि हो...
ही आणि असे कित्येक शिल्प आहेत...
कित्येक मूर्ती शिल्प इतिहासाचे मुक साक्षीदार होऊन आपली वाट पहात आहेत...
भूतकाळ आणि भविष्यकाळातील हा मुक संवाद संपण्यापूर्वी...
एकदा तरी पाहायलाच हवे...
हवे तर आपण ठरवून जाऊन येऊ... ☺️
मला तर फार आठवण येत आहे...😔
 https://olakhmurtishatrachi.blogspot.com/2022/10/blog-post_15.html
 
 मराठवाड्यात जगप्रसिद्ध अशा लेण्या आहेत, आता त्या माहिती बाबत काही नवीन राहीलं नाही. स्थापत्य आणि शिल्पकलेच्या परमोत्कर्ष वेरुळ येथील कैलास लेणी व अन्य लेणीत दिसून येतो. प्राचीन शिल्प स्थापत्य आणि चित्रकलांचा उत्कर्ष अजिंठा लेणीत बघायला मिळतो. शैलगृह स्थापत्याचा दक्षिणेतील पहिला आणि उत्तम आविष्कार म्हणजे पितळखोरा येथील लेणी. या शिवाय, धाराशीव, खरोसा, आणि औरंगाबादची बौद्ध लेणी. या सर्व लेण्यांनी मराठवाड्याच्याच नव्हे देशाच्या वैभवात भर घातली आहे. मराठवाडा संतांची भूमी. मराठवाड्याला समृद्ध अशा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, परंपरेचा इतिहास आहे. मराठवाड्याचा शिल्पकलेचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात ''जावे पा वेरुळा जेथे, विश्वकर्मियाने सृष्टी केली'' वेरुळची लेणी म्हणजे प्रत्यक्ष विश्वकर्म्याने घडवलेली अद्भूत सृष्टी.
     औरंगाबाद ही महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी. जागतिक वारसा असणाऱ्या वेरूळ आणि अजिंठा लेण्यांनी समृद्ध झालेला हा जिल्हा. या वैभवात भर घालण्याचे काम करतात त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामागील डोंगरात कोरलेल्या १२ बौद्ध लेणींचा समूह. या लेणी सहाव्या किंव्या सातव्या शतकातील आहेत. म्हणजेच अजिंठा लेणींच्या नंतर आणि वेरूळ लेणीच्या आधी याची निर्मीती करण्यात आली. लेणी तयार करणारे कलाकार एका ठिकाणाहुन दुसरीकडे फिरत असायचे. त्यांच्या दृष्टीक्षेपात औरंगाबाद शहराच्या पूर्वेकडील हा डोंगर पडला. त्यांनी येथे लेणी कोरण्यास सुरूवात केली. परंतु इथला दगड ठिसुळ होता. थोडे काम होताच दगड पडायचा. यामुळे इथले काम अर्धवट सोडुन त्यांनी पितळखोरा आणि नंतर वेरूळला प्रयान केले.
       मराठवाड्याच्या या शिल्प स्थापत्य परंपरांचा प्रारंभ इसवी सन पूर्वी पहिल्या शतकात झाला असे म्हणतात. प्रतिष्ठानच्या सातवाहन सत्तेचा उदय झाला आणि शिल्प स्थापत्य कलेला बहर आला. अजिंठ्याचा दगड म्हणजे कठीण खडक. ज्वालामुखी किंवा तत्सम गोष्टींमुळे त्याला एक टणकपणा आलेला तो खडक. बारीक छिद्र असलेल्या या खडकाला. कारागिरांनी घासून चांगला गुळगुळीत केला त्यावर चिखलांचा लेप दिला. अभियंते आणि अभ्यासक त्याला 'स्टको प्लास्टर' असे म्हणतात. औरंगाबादपासून डोंगरांची रांग सुरु होते, ती रांग थेट वेरुळ आणि पुढेही जाते. वेरुळच्या लेणी अगोदर औरंगाबादची लेणी कारागिरांनी कोरली असावी अशी शक्यता मानली जाते. कारण इथे हा प्रयोग फ़सला आणि कलाकार पुढे डोंगररांगांकडे गेले असावेत. 
या  लेण्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उत्तरेकडील औरंगाबादच्या डोंगरात पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला आहेत.औरंगाबाद शहरालगत ‘बीबी का मकबरा’पासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर डोंगरात या लेण्या कोरलेल्या आहेत. या लेण्या बौद्ध लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. त्यांची संख्या १२ इतकी आहे. बेसाल्ट हा खडक इतर खडकांच्या तुलनेत मृदू खडक म्हणून ओळखला जातो. अशा या बेसाल्ट खडकांत या लेण्या कोरलेल्या आहेत.औरंगाबाद लेण्यात तीन लेणी समुह आहेत.पहिला लेणी समुह टेकडीच्या पश्चिम टोकावर असून त्यात पाच लेणी आहेत.या लेणी समुहाच्या काही अंतरावर दुसरा लेणी समुह आहे.तिसर्‍या लेणी समुहातील लेणी एकतर सपाट आहेत किंवा अपुर्ण सोडलेली आहेत.  पूर्व-पश्चिम डोंगररांगेत दोन गटांत विभागलेल्या आहेत. यात एकूण नऊ लेण्या आहेत.
१८८६ ते  १८८९ या काळात पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक जेम्स बर्जेस यांच्या ग्रंथात या लेण्यांची नोंद आहे. बर्जेस हे १८७३ ते ८६ या काळात पुरातत्व विभागाच्या पश्चिम आणि दक्षिण विभागाचेही प्रमुख होते.
   एक लेणी हीनयान असून उर्वरित आठ लेण्या महायान पंथाच्या आहेत. लेणी क्रमांक चारमध्ये चैत्यगृह असून ही हीनयान पंथाची आहे. हे एक चैत्यगृह सोडल्यास बाकी सगळे विहार आहेत. ही लेणी प्राचीन असून तिस-या शतकात कोरलेली असावी. तर उर्वरित लेण्या सातव्या शतकापर्यंत खोदण्यात आल्या. लेणी क्रमांक १ ते ७ आणि ९ या लेण्या प्रेक्षणीय आहेत. येथे हीनयान, महायान आणि वज्रयान अशा लेण्या आढळतात. बोधिसत्त्व पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि वज्रपाणी यांच्या भव्य मूर्ती आहेत. पद्मपाणीच्या हातात कमळ, अवलोकितेश्वराच्या मुकुटात बुद्धांची मूती आणि वज्रपाणीच्या मुकुटात स्तूप असते. पहिल्या गटापासून दुस-या गटाचे अंतर अंदाजे एक किलोमीटर आहे.
    थेरवादी बौद्धांची लेणी इ.स नंतर दुसर्‍या व तिसर्‍या शतकातील आहेत. महायानी बौद्धांनी पाचव्या शतकात काही जुन्या लेण्यांत बदल करून नवीन लेणी तयार केली आणि सातव्या शतकानंतर वज्रयानी बौद्धांनी काही नवीन लेणी तयार केली. औरंगाबादला वज्रयानी बौद्धांचे वास्तव्य नवव्या-दहाव्या शतकापर्यंत होते.
औरंगाबादला पोहचलात की बीबीका मकबरा, पाणचक्की, ऐतिहासिक दरवाजे पाहून झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या ही बौद्ध लेणी. 
लेणीच्या पायथ्याशी आपल्या माता-पित्याच्या स्मरणार्थ अनेकांनी गौतमबुद्धांच्या धातूतील मूर्त्या लावलेल्या दिसून येतात. शंभर एक पाय-या चढून गेलात की तिकिट घर लागते. दहा रुपये देऊन तुम्हाला लेणीकडे जाण्यासाठी प्रवेश मिळतो. या डोंगररांगावर ऐकून पाच लेण्या आहेत.

       केंद्रीय पुरातत्त्व विभागाने मागील तीन वर्षात औरंगाबाद लेणी परिसरात जतन व संवर्धनाचे काम केले. पर्यटकांना थेट लेणीपर्यंत जाण्यासाठी विस्तीर्ण पायऱ्या बांधण्यात आल्या. पूल, संरक्षक कठडे आणि माहिती फलक लावले आहेत. परिसरात भरपूर झाडी असून संरक्षणासाठी पोलिस चौकी आहे. या सुविधा असूनही केवळ वाहतूक व्यवस्थेअभावी पर्यटनस्थळाची रया गेली आहे.
      फार पुर्वी या डोंगरात निपट निरंजन नावाचा सिध्द पुरुष रहात होता,त्यावरुन या लेण्यांना निपट निरंजन लेणी म्हणूनही ओळखले जाते.पुर्वीच्या व्यापारी मार्गावर असलेला राजतडाग तलाव येथून जवळ आहे.त्यामुळे या लेण्यांना राजतडागची लेणी असेही म्हणतात.
लेणी क्र. १:-
   पहिल्या क्रमांकाचे लेणे अपुर्ण असले तरी आकर्षक आहे.त्याचा दर्शनी भाग पडून गेला असला तरी दर्शनी चार स्तंभांचे पायाकडचे अवशेष शिल्लक आहेत.हे लेणे सुमारे २५ मीटर लांबीचे असून व्हरांड्याच्या मागील भिंतीत तीन दरवाजे व दोन खिडक्या कोरलेल्या आहेत.यक्ष्,किन्नर्,सेवक्,सेविका व इतरही अनेक शिल्प आहेत.लेणीक्रमांक एक हाही एक मोठा विहार आहे. 
दरवाजा खिडक्या असलेले अंतगृह आहे. त्यावरील कोरीवकाम अतिशय सुंदर आहे. पडवीत खांब आहेत. खांबावर नक्षीकाम केलेले दिसून येते. छताचे वजन पेलण्यासाठी उभ्या केलेल्यां खांबांवर सुंदर स्त्री शिल्पे आहेत. वस्त्र, अलंकार त्या काळातील वेशभूषांचे आणि अलंकाराचे उत्कृष्ट दर्शन घडवितात. कलाकुसर अत्यंत मनोहर आहे. प्रवेश द्वाराची चौकट नक्षीकामाने मढवून काढलेली आहेत. 

धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्ध

विहाराच्या पश्चिम बाजूला खिडकी दरवाजांच्यामधे कमलासानावर भगवान बुद्धाची प्रतिमा विराजमान असून त्यांच्या बाजूला चामरधारी सेवक आहेत. त्यांचे सिंहासन पाच फणे असलेल्या नागराजाने स्वतःच्या डोक्यावर धारण केले आहे. याच भिंतीच्या पडवीत डाव्या भागात भगवान बुद्धांच्या सात आकृती ओळीने कोरलेल्या आहेत. त्यांच्या बाजूलाच दोन बोधिसत्वाची सुंदर शिल्प आहेत. लेण्यांच्या एका भिंतीवर कोरण्यात आलेली एक सुंदर मत्स्याकृतीही आहे.
नंद उपनंद नाग अनुयायींसह बुद्धमूर्ती
उपासकांसाठीच्या खोल्या
लेण्यांमधे खूप शिल्प नाहीत. पडवीत मात्र खूप शिल्प आहेत. उजेडाची कोणतीही सोय नसल्यामुळे फोटो काढणे कठीण जाते.

लेणी क्र. २ : 

  हे लेणे लक्षवेधी आहे,याचा व्हरांडा ६.३० मीटर रुंद व ३.९१ मीटर लांब आहे. याला आठ दर्शनी कोरीवकाम केलेले खांब आहे.हा बहुधा विहार आहे.दीर्घिका, मध्यवर्ती दालन व प्रदक्षिणा मार्ग अशी या लेणीची रचना आहे. यातील गाभार्यात भगवान गौतमबुद्धाची प्रलंबपाद आसनातील भव्य मूर्ती आहे. उजवीकडे विविध आसनातील बुद्ध मुर्ती आहेत. यात शिल्पकाम भरपूर आहे परंतु त्याची झीज झालेली आहे.

leni

लेणी क्र. ३ :

 लेणी क्रमांक तीन हे एक विहार असून पहिल्या आणि दुसर्‍या लेण्यातील विहारापेक्षा याचे स्वरूप जरा वेगळे आहे. हे एक प्रेक्षणीय विहार आहे. या लेण्याचा व्हरांडा ९.३० मीटर लांब व ३.२९ मीटर रुंद आहे.भिंतीच्या दोन बाजुच्या भिंतीमध्ये प्रत्येकी एक अशी दोन मंदिरे आहेत.मंडपाच्या मागे अलंकारयुक्त गर्भगृह आहे,गर्भगृहात प्रदक्षिणा पथ नाही.यातील सभा मंडपात बारा सुशोभित स्तंभ आहेत. सर्व स्तंभ वेगवेगळ्या नक्षीकामांनी सजविलेले आहेत. येथे एका स्तंभाच्या नाटेवर (तुळई) सूतसोम जातक कथेचे शिल्प कोरलेले आहे. आतील प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेले दिसून येते. छताच्या वरच्या बाजूला पाने, फुले कोरलेली दिसतात त्या खाली उभ्या असलेल्या शालभंजिका कोरल्या आहेत. पत्येक खांबावर चक्रकार पट्टे कोरले असून त्यात सुंदर गुलाब पुष्पांचे कोरीव काम आहे. जवळ जवळ बारा खांब आहेत. वंदनागृहाच्या गाभार्‍यात भगवान बुद्धाची भव्य प्रतिमा खाली पाय सोडून धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहेत. एकाबाजूला सात पुरुष उपासिका आणि एका बाजूला सहा स्त्री उपासिका आराधनेसाठी बसलेल्या दिसतात. स्त्रीयांच्या अंगावर विविध अलंकार हातात पुष्पमाळा दिसतात. याच लेणीतील पट्टुयांवर युद्धाचे दृष्य कोरलेले दिसून येते. तिथेच भगवान बुद्ध आसनावर पहुडलेले दिसून येतात. हीच लेणी या लेण्यांचा आत्मा आहे.

ध्यानमुद्रेतील बुद्ध

वज्रपाणी

बोधीसत्व ----> शलभंजिका

स्तंभ

गाभार्यात प्रलंबपाद आसनातील सिंहासनावर बसलेली भगवान बुद्धाची मूर्ती आहे. मूर्तीच्या उजव्या व डाव्या बाजूस आदरभावयुक्त भक्तजन दाखविण्यात आले आहेत. हे भक्तजन आफ्रिकेतील कृष्णवर्णीय असावेत असे त्यांच्या केसाच्या रचनेवरून वाटते.

लेणी क्र. ४ : ही येथील सर्वात प्राचीन लेणी आहे. इसवी सनाच्या तिसर्या शतकातील असावी. हीनयान पंथाचे हे चैत्यगृह आहे. यातील तुळ्याचे छत व स्तूपावरील कोरीव काम अतिशय कुशलतेने केलेले आहे.या लेण्याचा संपुर्ण दर्शनी भाग ढासळला असताना तो पुन्हा बांधून जुन्या भागाला एकसंधपणे जोडला आहे.यासाठी पुरातत्वखात्याला नक्कीच धन्यवाद द्यायला हवेत.या लेण्याला बघून कार्ल्याच्या लेण्याची आठवण होते. या लेण्यातील दागोबा २ मीटर व्यासाचा आहे.स्तूपावर कोणत्याही प्रकारचे कोरीव काम नाही. सूर्याची किरणे सरळ या स्तूपावर पडावीत अशा पद्धतीने त्याची रचना केलेली दिसते, मात्र याच उद्देश्यानं हा स्तूप केला असावा असे म्हणायला काहीही आधार नाही.या लेण्यातील स्तुप सध्या मोडकळीला आलेला असून त्याच्यावरील पायर्‍यासारखी आधार देणारी दगडी हार्मिका अजुन शिल्लक आहे.याचे अर्धवर्तुळाकृती छत जुन्या चार व नव्याने बांधलेल्या १३ अश्या एकुण सतरा अष्टकोनी ४ मीटर उंचीच्या अजस्त्र खांबांनी तोलुन धरलेले आहे.या लेणीची गंमत अशी सांगितल्या जाते की भगवान बुद्धाला पार्श्वनाथ किंवा महावीर समजून काही जैनमुनींनी लेणीचा ताबा घेतला होता व तो पुढे सोडलाही होता. (संदर्भ नाही) लेण्यांची शैली पहिल्या शतकातील व मथुरा शैली अथवा गांधार शैलीमधे मोडत असावी. अजिंठा लेण्यातील बहुतेक प्रतिमा या धम्मचक्रप्रवर्तनमुद्रेमधे हात असलेले आहेत आणि इथेही तशाच प्रतिमा आहेत तेव्हा लेणींचा काळ सारखा असावा असे वाटायला लागते.


लेणी क्र. ५ : या लेणीत जैन तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांची ध्यानस्थ मूर्ती आहे.या लेण्याचा बराचसा दर्शनी भाग बराचसा नष्ट झालेला आहे.इथे काही दालने व एक बुध्दमुर्ती सिंहासनावर बसलेल्या स्थितीत शिल्लक आहे.ध्यानमुद्रेतील पद्मनाभस्थ बुध्दाच्या पायाशी नंतर जैन धर्मीयांनी शंखमुद्रा कोरली.

औरंगाबादच्या बौद्ध लेणीतील गणपती बाप्पा

लेणी क्र. ६ : या लेणीपासून पुर्वेकडील गटास आरंभ होतो. या लेणीची दोन दालने आहेत. पहिल्या दालनात श्री. गणेशाची मूर्ती आहे. त्यासोबत सप्तमातृका कोरलेल्या आहेत. बाजूला भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आहे. दुसर्या दालनात भगवान बुद्धाची मूर्ती व काही बौद्ध शिल्पे आहेत.लेण्यामध्ये गणपतीची मूर्ती तर शेजारीच भगवान गौतम बुद्ध विराजमान आहेत. बौद्ध लेण्यात गणेशाची मूर्ती असणे हा दुर्मिळ योगायोग आहे. यामुळेच गणेशोत्सवात या लेणीस भेट देणे ही गणेश भक्तांसाठी पर्वणीच ठरू शकते.

औरंगाबाद लेण्यांची निर्मीती चालुक्यांच्या काळात झाली. राजा चालुक्य प्रजेला समान वागणुक द्यायचा. म्हणुनच त्याने जाती धर्माचा विचार न करता बौद्ध धर्मीय लेणी तयार केल्या. चालुक्य हे सप्तमातृका आणि गणेशाचे पूजक होते. यामुळेचे लेणी क्रमांक ६ मध्ये पाच फुटी उंचीची श्रीगणेशाची मूर्ती कोरण्यात आली आहे.  या मूर्तीच्या बाजुला सप्तमातृका तर डाव्या बाजुला बुद्धमूर्ती आहे. भगवान बुद्धाची मूर्ती ही परलम्बापद् मुद्रेतील आहे. तर त्याला लागुन असलेल्या भिंतीवर स्त्री-पुरूषांच्या आकृत्या आहेत. लेणीमध्ये मधोमध ही मूर्ती कोरल्यामुळे तिचे स्थान प्रधान ठरले आहे. यावरून गणपतीच्या पूजेचे महत्व चालुक्य काळातही होते हे अधोरेखित होते.

बहुधा बोधीसत्व आणि मद्दी (विश्वंतर जातक)

लेणी क्र. ७ : त्या काळातील शिल्पकलेचे काही अप्रतीम नमुने आजही या लेणीत आहेत. सकाळची सूर्यकिरणे थेट गाभार्यात भगवान बुद्धाच्या मूर्तीला स्पर्श करतात. त्यामुळे ही मूर्ती सजीव व चैतन्यमयी भासू लागते. मूर्तीच्या एका बाजूला नर्तकीचा एक अलौकिक शिल्पपट आहे. हा शिल्पपट शिल्पकलेच्या इतिहासातील एक मानबिंदू समजला जातो. यात नृत्यात तल्लीन झालेली नर्तिका व वाद्यवृंदासह साथ देणार्या युवतींचे कोरीव काम देखणे व अतिशय विलोभनीय आहे. हा शिल्पपट अंधारात आहे. प्रकाश परावर्तीत करणार्या बोर्डाच्या साहाय्याने या शिल्पातील सौंदर्याचे दर्शन घडते. अंधार असलेल्या सर्व लेण्यांत अशा बोर्डाची व्यवस्था आहे. गाभार्यातील प्रवेश दारावर पद्मपाणी अवलोकितेश्वर यांची उभी मूर्ती असून त्यांच्या दोन्ही बाजूस अष्टमहाभयाचे प्रसंग कोरलेले आहेत. याच्या डावीकडील दालनात ध्यानी बुद्धाच्या व उजवीकडील दालनात पांचिक व हरितीचे शिल्प आहे.

     औरंगाबाद येथील काही शिल्प अजिंठ्याच्या शिल्पापेक्षाही सुंदर आहेत. सात नंबरच्या लेण्यांत, बोधिसत्व अवलोकेतेश्वर अग्नी, शत्रूची तलवार, कैद होणे, पाण्यात बोट बूडणे , इत्यादी पासून तसेच सिंहासारख्या हिंस्र पशूपासून, सापादि सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, पिसाळलेल्या हत्तीपासून अणि रोगापासून निर्माण होणाऱ्या संकटातून उपासकांचे कसे संरक्षण करतो हे दाखविले आहे.अशा शिल्पाला ” वंदना शिल्प” असे म्हणतात. या वंदनेत आठ प्रकारच्या संकटातून रक्षण व्हावे म्हणून अवलोकेतेश्वराला विनंती केलेली असते. व्यापाऱ्यांना प्रवासात आणि इतरत्र उत्पन्न होणाऱ्या संकटांची सर्वसाधारणपणे ही एक यादी आहे. असे वंदन शिल्प किंवा चित्र, महायानी आणि वज्रयानी बौद्धांनी बर्‍याच ठिकाणी काढून घेतल्याचे दिसून येते.


अवलोकितेश्वर पद्मपाणी

लेणी क्र. ९ : ही येथील सर्वात भव्य लेणी आहे. यात भगवान गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाणाचे विशाल शिल्प ओ. हे शिल्प अर्धवट व जीर्ण अवस्थेत आहे. या लेणीतील काही मूर्तिंच्या डोक्यावरील नागफणीचे काम अतिशय उत्कृष्ट आहे    



The neglected caves are in the spotlight; Careful cleaning of caves hidden in the bushes in the mountains of Aurangabad | दुर्लक्षित लेण्या आल्या प्रकाशझोतात; औरंगाबादच्या डोंगरांत झाडाझुडपांत दडलेल्या लेण्यांची श्रमदानातून स्वच्छता

बेगमपुरा आणि परिसरात या लेण्या चोर लेण्या म्हणूनही ओळखल्या जातात. पहिल्या गटापासून दुसर्या गटाचे अंतर अंदाजे एक किलोमीटर आहे. अजिंठा व वेरूळ प्रमाणे याही लेण्या रंगीत होत्या. रंगकामाचे अवशेष येथे आजही पाहावयास मिळतात.
पर्यटकांना औरंगाबाद लेणी दूरच 
      वेरूळ-अजिंठा लेणीप्रमाणेच औरंगाबाद लेणी पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. सहाव्या ते आठव्या शतकात बसाल्ट डोंगरात ही लेणी घडवली आहे. वेरूळ लेणीची प्रतिकृती म्हणूनही विदेशी पर्यटक औरंगाबाद लेणी पाहतात. बिबी का मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी आहे; मात्र औरंगाबाद लेणी पाहण्यासाठी जेमतेम पर्यटक येतात. बिबी का मकबऱ्यापासून लेणी जवळ आहे. शिवाय या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि सोनेरी महल आहे. तरीसुद्धा मोजकेच पर्यटक लेणी पाहतात. 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे पर्यटक येत नसल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. मकबरा परिसरात लेणीचा माहितीफलक आहे; पण लेणीपर्यंत जाण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. परराज्यातील आणि विदेशी पर्यटकांकडून रिक्षाचालक दोनशे ते पाचशे रुपये भाडे वसूल करतात. रिक्षाचालक मीटरनुसार भाडे आकारत नसल्याचा अनुभव अनेक पर्यटकांना आला आहे. त्यामुळे पर्यटक लेणी पाहणे टाळतात. रिक्षाचालकांच्या अरेरावीविरुद्ध तक्रारी आल्यानंतरही प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरू केली नाही. पर्यटकांना लेणीपर्यंत पोहचण्यासाठी शहर बसची नितांत गरज आहे.
जपानी पर्यटकांची वर्दळ
   सध्या जपान आणि चीन या दोन देशातील बहुतेक पर्यटक औरंगाबाद लेणी आवर्जून पाहतात. बौद्ध कलाकृती अनुभवण्यावर त्यांचा भर असतो; मात्र लेणीपर्यंत पोहचण्यासाठी या पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. इतर पर्यटकांनाही लेणीकडे वळवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे असे पर्यटनप्रेमींनी सांगितले.
लेणीत सुसज्ज व्यवस्था
  केंद्रीय पुरातत्त्व विभागाने मागील तीन वर्षात औरंगाबाद लेणी परिसरात जतन व संवर्धनाचे काम केले. पर्यटकांना थेट लेणीपर्यंत जाण्यासाठी विस्तीर्ण पायऱ्या बांधण्यात आल्या. पूल, संरक्षक कठडे आणि माहिती फलक लावले आहेत. परिसरात भरपूर झाडी असून संरक्षणासाठी पोलिस चौकी आहे. या सुविधा असूनही केवळ वाहतूक व्यवस्थेअभावी पर्यटनस्थळाची रया गेली आहे.
दुर्लक्षीत आहेत लेणी
 अजिंठा-वेरूळ लेणींच्या झगमगाटा पुढे औरंगाबाद लेणींचे महत्व कमी ठरत आहे.  शहराच्या आडमार्गावर असल्यामुळे येथे टूर ऑपरेटरही पर्यटकांना नेतांना कचरतात. पर्यटकही स्वत:हुन येथे जात नाहीत. जगातील मोजक्याच बौद्ध लेण्यात गणेशाची मूर्ती बघायला मिळते. यामुळे या दुर्मिळ लेणीला  एकदा भेट द्यायला हरकत नाही.
संदर्भग्रंथः-
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयर
२) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांचा लेख
३) धम्मचक्र टीमने दिलेली माहिती
४) सहली एक दिवसाच्या औरंगाबाद परिसरात -पांडुरंग पाटणकर
५) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स

















ह्या लेण्यांचा काळ साधारण ६ वे ८ व्या शतकाच्या दरम्यानचा. म्हणजे अजिंठ्यानंतर आणि वेरुळच्या आधीचा. कदाचित कलचुरी राजवटीच्या अमदानीत ही लेणी खोदली गेली असावीत.

इथे फ्रेस्को आहेत का? तुमच्या लेखात तसा उल्लेख नाही.

इथली शैली गांधार अजिबात नाही पण मथुरा शैलीतून पुढे विस्तार पावलेल्या अजंठा स्कूल ऑफ़ आर्ट्सशी खूपच मिळतीजुळती आहे.

बहुतेक बुद्ध धम्मचक्रप्रवर्तन मुद्रेत आहेत. काही बुद्ध ध्यानी बुद्ध दिसताहेत. अवलोकितेश्वर पद्मपाणी आणि वज्रपाणी पण दिसत आहेत.
येथे काही वज्रयान शिल्पे आहेत का? तारा, महामायुरी वगैरे? वर स्त्री उपासकांचा उल्लेख तुमच्या लेखात दिसतोय. हे स्त्री उपासक नसून मला स्त्री बोधिसत्व वाटतात. लेणी प्रत्यक्ष बघायलाच हवीत.

ते सात पुरुष उपासक म्हणजे मानुषी बुद्ध असावेत.
महायान पंथ २४ बुद्धावतार मानतात. पैकी महायान शेवटच्या सात अवतारांना मानुषी बुद्ध असे नाव देतात. शेवटचा आठवा मानुषी बुद्ध हा 'मैत्रेय' हा भविष्यातील बुद्ध आहे जसे हिंदू 'कल्की' यास भविष्यातील विष्णू अवतार मानतात.

हे सात मानुषी बुद्ध पुढीलप्रमाणे. यातील प्रत्येकास त्यांचा स्वतंत्र बोधीवृक्ष आहे.
१. विपश्यी
२. शिखी
३. विश्वभू
४. क्रकुच्छन्द
५. कनकमुनी
६. काश्यप
७. शाक्यमुनी

यातील सातव्या शाक्यमुनीलाच गौतम बुद्ध असेही मानले जाते.


वल्लीसाठी प्रतिसाद. वल्ली, मथूरा शैली मला अजिबात वाटत नाही. मथूरा शैली म्हणजे शिल्प अधिक वास्तवतेकडे झूकणारे असतात. विशेषतः स्त्री सौंदर्याच्या बाबतीत आकार अधिक उठावदार चैतन्यपूर्ण पुषकळसा निसर्गनियमानुसार जे जे दाखवता येईल ते ते...सर्व मथुरा शिल्पात असावे असे वाटते. एक शलभंजिका ज्याचे मी छायाचित्र टाकले आहेत तीची तेवढी जरा कंबर बारीक, पुष्ट वक्षःस्थळ व अलंकार यांनी युक्त अशी दिसते. म्हणजे खात्रीशीर मी सांगू शकत नाही.

ही गांधार शैली अजिबात नाही. गांधार शैलीवर हेलेनिस्टिक प्रभाव आहे. तसा इकडील शिल्पांवर अजिबात दिसत नाही. मग इथली शैली गांधार नाही तर मथुरा आहे का? तर तसेही नाही.

मथुरा शैलीतून गुप्त काळातील शिल्पे हळूहळू विकसित होत गेली. गुप्त शिल्पकलेचा मोठा प्रभाव वाकाटक राजवटीवर पडला. ह्याच वाकाटक काळात अजिंठ्याची जगप्रसिद्ध शिल्पे आणि चित्रे विकसित झाली. आणि अजिंठ्याची नवीनच शैली तयार झाली. आज अजिंठा म्हटलं की सर्वांच्या डोळ्यांसमोर चित्रेच येतात पण तिथे काही फ़्याण्टास्टीक शिल्पे आहेत. जसं लेणी क्र.१ मध्ये ज्म्भाल आणि हरिती, लेणी क्र. २६ मध्ये महानिर्वाण, मारविजय, लेणी क्र. २० मध्ये नागराज.

ह्या शिल्पांचा मोठा प्रभाव औरंगाबाद लेणीवर दिसतो. कलचुरींच्या काळात हाताची घडी घातलेल्या काही आयुधपुरुष मूर्ती दिसतात. तशा औरंगाबाद लेणीत आहे की नाही ते माहीत नाही पण तुम्ही लेखात दिलेल्या वज्रपाणीची मूर्ती तशी असावी असे वाटते.

तसंही महायान स्थापत्यशैलीत शालभंजिका आणि स्त्री बोधिसत्व सोडले तर स्त्रीशिल्पांना फारसे स्थान नाही. शिवाय बौद्ध धर्मातल्या ह्या मूर्ती असल्याने स्त्रीसौंदर्याला फारसे स्थान न मिळता जास्त करून वैराग्यस्वरूपच असतात.

भारताच्या पच्छिमेस ग्रीक राज्य होती त्यामुळे ग्रीक रोमन कलेशी भारतीय कलाकारांचा परिचय झाला. बौद्ध धर्मात महायन पंथाचे अधिक प्राबल्य वाढल्यामुळे बुद्धाची मूर्ती घडविण्यास असलेल्या हीनयान पंथांच्या विरोधाची धार नाहीशी झाली . ग्रीक देवदेवतांच्या आदर्शवादी मूर्तीप्रमाणे भारतात पहिल्यांदाच अशा बुद्धांच्या आणि बोधीसत्वाच्या मूर्ती मानवस्वरुपात घडविण्यात आल्या. ग्रीक रोमन वास्ववादी शैली आणि भारतीय सांकेतिक अलंकारिक शैली यांच्या मिश्रण किंवा विकास होऊन जी शैली निर्माण झाली ती शैली गांधार शैली. ( बरोबर की चूक)

बुद्ध व बोधीसत्व मूर्तीवरील प्रवाही व लयदार झुपके, केशकलाप, अंगावर वस्त्र घेण्याच्या पद्धत. वस्त्राच्या वास्तववादी पद्धतीने (थ्रीडी) चुण्या यामधे ग्रीम रोमन कलेचा स्पष्ट प्रभाव दिसतो.

मानवी स्वरुपातील बुद्धमुर्तीत देवत्वाचा प्रत्यय यावा म्हणून डोक्याच्या वर बांधलेली केसांची उष्णीशा नावाची गाठ, दोन भूवयामधे तृतीय नेत्र, कानांची खाली लोंबणारी पाळी, डोक्याच्या मागे प्रभावलय. हाताचा पंजा व तळपाय यावरील चक्र...हाताच्या पारंपरिक मुद्रा.... याप्की उष्णिशा ही केसांची गाठ अपोलो या ग्रीक देवाच्या मूर्तीतही आढळते. बाकी लक्षणे मात्र भारतीय आहेत.

-दिलीप बिरुटे 

गांधार शैलीबद्दल तुमचं विवेचन बरोबर आहे.
पण ह्या शिल्पांवर हेलेनिस्टीक प्रभाव अजिबात दिसत नाही. दिसलाच तर नगण्य.
तसं बघायला गेलं तर कान्हेरीच्या चैत्यातील उपमंडपात असलेल्या अवलोकितेश्वराच्या मूर्तीवर गांधार कलेचा प्रभाव दिसतो पण इतर ठिकाणी नाही.

इथल्या बुद्धमूर्तींची वस्त्रे चुणीदार अजिबात नाहीत. आता केशकलाप म्हणाल तर बुद्धमूर्तीचे ते व्यवच्छेदक लक्षण आहे. पण इतर सर्व लक्षणे भारतीयच आहेत.

जाताजाता अवांतर- जुन्या बुद्ध साहित्यामध्ये बुद्धाचे वर्णन मुंडन केलेले असे आहे. बुद्धाचा केशकलाप हा महायानकाळात मूर्तीवर चढवला गेला.

हेलेनिस्टिक प्रभाव अगदी नावापुरताय. बाकी हि अजंठा शैली अस्सल भारतीय अन मथुरा शैलीवरूनच विकसित झालीय. समांतर वस्त्रचुण्या, रिअलैस्टीक नाही पण सांकेतिक शरीर चिन्हे, लघुचित्रात आढळणारी चेहऱ्याची वक्राकार ठेवण, आम्रफळाप्रमाणे चेहरे आणि इतर सर्व अस्सल भारतीय कलावैशिष्ये (कृषकटी, घटा प्रमाणे स्तनभार, त्रिभंन्ग अथवा समभंग उभे राहण्याची पध्द्त, स्नायू ऐवजी बाह्याकार महत्व)अजंठा शैली हि गांधार शैली किंवा त्यावरून प्रेरित नाही हेच सिद्ध करते. हि विकसित मथुरा शैलीच.

 मोहक पण गंभीर चेहरे, प्रमाणबद्ध शरीरयश्टी. रोमन टोग्यासारखी वस्त्रे, अर्धोन्मीलित नयनांनी धानस्थ अवस्थेत बुद्धाची मानवस्वरुपात विलोभनीय मूर्ती ही गांधार शैलीची वैशिष्टे आहेत रे....






No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...