किल्ल्याची ऊंची : 2700
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा
जिल्हा : औरंगाबाद श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्हा हा लेण्यांनी नटलेला आहे. या जिल्हातील जगप्रसिध्द अजंठा लेणी ही, सह्याद्रीच्या अजंठा रांगेत कोरलेली आहे. या अजंठा रांगेत अनेक किल्ले आहेत, यापैकी सर्व किल्ल्यांचा राजा अंतुर किल्ला आहे.
पहाण्याची ठिकाणे :
अंतुर किल्ल्यावर नागापूरहुन वहानाने किंवा गोपेवाडीतून चालत आल्यास आपण किल्ल्याच्या भव्य बुरुजाजवळ पोहोचतो (इथेच वहानतळ बनवलेला आहे). येथून सिमेंटच्या पायवाटेने किल्ल्याचा पहिल्या दरवाजाकडे जातांना वाटेत डाव्या बाजूस पहार्याची चौकी दिसते. पायवाटेच्या वरच्या बाजूस काही बुरुज दिसतात. त्यात एक तिहेरी बुरुज आहे. पुढे थोड्या पायर्या चढल्यावर पहिला दरवाजा लागतो.हा दरवाजा दक्षिणाभिमुख आहे. दरवाजाच्या समोर एक दगडी तोफगोळा पडलेला दिसतो. दरवाजाच्यावर कमानीच्या दोन बाजूला असलेल्या कोनाड्यात पूर्वी शरभ होते. आता फक्त उजव्या कोनाड्यातील शरभ शाबुत आहे. दरवाज्यातून पुढे जाणार्या वाटेच्या दोन्ही बाजूला तटबंदी आहे. यावाटेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर आपण दुसर्या दरवाज्यापाशी पोहोचते. पहिल्या दरवाजाला काटकोनात असलेला हा भव्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूचे बुरुज चौकोनी आहेत. दरवाजाच्या कमानीत शत्रुवर मारा करण्यासाठी (गरम तेल/ निखारे यांचा) खाचा ठेवलेल्या आहेत. आतमध्ये पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. या दरवाजाच्या आतील बाजूस २ कमळपुष्पे कोरलेली आहेत आणि ४ तोफगोळे दरवाजावर लावलेले आहेत. दुसर्या दरवाजातून आत आल्यावर पायर्यांची वाट काटकोनात वळून तिसर्या दरवाज्यापाशी जाते. हा दरवाजा सुध्दा दक्षिणाभिमुख आहे. कमानीवर कमळपुष्पे कोरलेली आहेत. कमानीवर मध्यभागी ५.५ फ़ूट लांब व २ फुट रुंद फारसी लिपीतील शिलालेख आहे. कमानीवर जाण्यासाठी आतल्या बाजूने पायर्याही आहेत. दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजवीकडे एक उध्वस्त वास्तु आहे. त्यात काही कोरीव दगड पडलेले आहेत.
दरवाजातून आत शिरल्यावर समोर तलाव दिसतो. तर उजवीकडे जाणारी वाट एका बाजूला किल्ल्याची तटबंदी आणि राजवाडा यामधून पुढे जाते. या राजसंकुलात जाण्यासाठी छोटे प्रवेशव्दार आहे. आत दोन मोठे वाडे बांधलेले दिसतात. यांच्या वर घुमट आहेत. एका वाड्याच्या वर जाण्यासाठी पायर्याही कोरलेल्या दिसतात. या वाड्याच्या मागे काही थडगी आहेत. वाड्यातून बाहेर पडून पश्चिम टोकाकडे चालत जातांना वाटेत एक दर्गा दिसतो. पुढे चौकोनी आकाराचा सुटा टेहळणी बुरुज आहे. त्यावर चढायला पायर्या आहेत. या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो. बुरुज पाहून तलावाजवळ यावे. या तलावातील पाणी खराब झालेले आहे. या तलावाच्या एका बाजूला गोदी नावाचा दर्गा आहे. वाड्याच्या विरुध्द दिशेला तलावाच्या दक्षिणेला एक भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा इथे बांधण्याचे प्रयोजन मात्र कळत नाही. प्रवेशव्दाराच्या मागिल बाजूस पडक्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. हे सर्व पाहून पश्चिमेकडे दिसणार्या बुरुजाकडे चालत जातांना दोन उध्वस्त वास्तु लागतात त्यातील तलावाजवळील तळघर असलेली वास्तू म्हणजे दारुखाना असावा. बुरुजापासून तटबंदीच्या कडेकडेने उतरणारी वाट आपल्याला कातळाच्या पोटात कोरलेल्या टाक्यांपाशी घेऊन जाते. येथे चार खांब टाकी कोरलेली दिसतात. त्यापैकी एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांच्या वरच्या बाजूला एक कोरडा बांधीव तलाव आहे.
टाकी पाहून परत बुरुजापाशी येऊन किल्ल्याच्या दक्षिणेकडील निमुळत्या भागाकडे चालायला सुरुवात करावी. इथे एक विशेष गोष्ट जाणवते ती म्हणजे या भागाला किल्ल्यापासून विभागणारी एक तटबंदी आणि २ बुरुज बांधलेले आहेत. या तटबंदी मधून पलिकडच्या बाजूला जाण्यासाठी एक दरवाजा काढलेला आहे. आत प्रवेश केल्यावर आपण गडाचे दक्षिणेकडचे टोक गाठतो. या भागात एक तोफ पडलेली दिसते. त्याच्या समोरच तटबंदी आणि मागचा बुरुज यामध्ये एक छोटीशी खोली आहे. बाजुलाच एक दरवाजा व आतमध्ये पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. हा भाग म्हणजे अंतुर किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेला भव्य बुरुज. हा बुरुज आणि समोरचे पठार यात ५० फुटाचे अंतर आहे. मोठ्या डोंगर रांगेपासून किल्लावेगळा करण्यासाठी येथे कातळ फ़ोडून ५० फ़ुटाचा खंदक निर्माण करण्यात आलेला आहे आणि या खंदकाच्या किल्ल्याच्या बाजूला भव्य बुरुज बांधून किल्ला मजबूत केलेला आहे. सध्या या बुरुजाच्या आत गैबनशाली बाबाचा दर्गा आहे. आत शिरल्यावर बुरुजावर जाण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. बुरुजावरुन समोरचे पठार आणि वहानतळ दिसतो.
अंतुर किल्ल्यापासून नागापूरला जातांना रस्त्याच्या खालच्या बाजूस डावीकडे एक पूरातन मैलाचा दगड दिसतो. त्यावर फ़ारसी भाषेत चार शहरांना जाणारे मार्ग दाखवलेले आहेत.
अंतुर किल्ला दुर्लक्षित असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
अंतुर किल्ला हा महाराष्ट्राच्या जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर बसलेला आहे. इथे वहानाने पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत.
१) औरंगाबाद मार्गे :- औरंगाबाद मार्गे कन्नड गाठावे. कन्नड - नागापूर अंतर २० किमी आहे. कन्नडहुन नागापूरला जाण्यासाठी एसटी बस किंवा जीप मिळू शकतात. वनखात्याने नागापूर पासून अंतुर किल्ल्यापर्यंत कच्चा रस्ता केल्यामुळे. पावसाळा सोडून इतरवेळी वहानाने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते.
एसटी बस किंवा जीपने नागापूर गावात उतरल्यास :- नागापूर गावातून ३ किमी अंतरावर कोलापूर नावाचे गाव लागते. इथपर्यत नागापूर पासून पोहचण्यास पाऊण तास पुरतो. पुढे कोलापूर पासून किल्ल्याच्या पायर्या गाठण्यास दीड तास लागतो. कोलापूर गाव मागे टाकल्यावर दहा मिनिटात वाट डावीकडे वळते. इथून १५ मिनिटे चालल्यावर उजवीकडे एक मारुतीची मूर्ती लागते. या मूर्तीच्या समोरुन वाट डोंगराच्या डावीकडून पुढे सरकते. लक्षात ठेवण्यासारखी खूण म्हणजे ही वाट डोंगराच्या नेहमी डावीकडूनच पुढे जाते. पुढे एका डोंगरावर घुमटीसारखा भाग दिसतो. पण तिथे वर न जाता पुन्हा डोंगराला डावीकडून वळसा घालत वाट दरीपर्यंत येऊन थांबते. इथून अंतुरचे प्रथम दर्शन होते. दर्शन घेऊन पुन्हा अंतुरच्या दिशेने चालत सुटायचे. वाट किल्ल्याच्या समोर असणार्या पायथ्याशी येऊन पोहचते. वर न चढता उजवीकडे जंगलात पठाराला डावीकडे ठेवत जाणारी वाट धरायची आणि १० मिनिटातच डावीकडे एक पहारेकर्यांची देवडी लागते. २ मिनिटातच गडाचा पहिला दरवाजा दिसतो. नागापूर पासून पहिल्या दरवाज्या पर्यंत पोहचण्यास दोन ते अडीच तास लागतात.
२) चाळीसगाव मार्गे :- चाळीसगाव - सिल्लॊड रस्त्यावर नागापूर गाव आहे. चाळीसगावपासून ४० किमी अंतरावर नागापूर आहे. वनखात्याने नागापूर पासून अंतुर किल्ल्यापर्यंत कच्चा रस्ता केल्यामुळे. पावसाळा सोडून इतरवेळी वहानाने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते.
चालत जाण्यासाठी :- चाळीसगाव - सिल्लॊड रस्त्यावर नागद गाव २० किमी अंतरावर आहे. नागद गावातून पांगरा- बेलखेडा मार्गे गोपेवाडी गाठावी. गोपेवाडीच्यावर एक धनगरवाडा आहे. पावसाळा सोडुन इतरवेळी वहानाने थेट धनगरवाड्यापर्यंत जाता येत. अथवा गोपेवाडीतून चढायला सुरुवात करावी. येथून चालत ३ तासात अंतुर किल्ल्यावर जाता येते. चाळीसगाव - नागद बस सेवा आहे. पुढे बस मिळण कठीण असल्याने खाजगी वहानाने गोपेवाडीपर्यंत जाण सोयीच आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावरील मशिदीमध्ये १० ते १५ लोकांना रहाता येऊ शकते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
नागापूरहून चालत जाण्यास अडीच तास लागतो. गोपेवाडीतून चढुन जाण्यास तीन तास लागतात.
साधारण सापुतारा-हातगडापासून सुरु होणारी सातमाळा पर्वतरांग मनमाड पर्यंत धावत येते. आणि पुढे मनमाड-चाळीसगाव मार्गे थेट औरंगाबाद जिल्ह्यात जाणार्या ‘अजिंठा’ रांगेचा हात पकडते. चाळीसगावपासून पुढे औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असणार्या गौताळा अभयारण्याच्या दाट वनराईत या अजिंठा रांगेचे भक्कम, बळकट, रांगडे, श्रीमंत आणि गडावषेशांचे अलंकार लेवून नटलेले महत्त्वाचे किल्ले लपलेले आहेत. त्यात प्रथम मान जातो तो अंतुर किल्ल्याला.

औरंगाबाद जिल्हा ऐतिहासिक वारशांसाठी जगप्रसिद्ध. भारतातील सर्वात देखण्या लेणी आणि वास्तूंबरोबरच हा जिल्हा देखणे किल्लेही बाळगून आहे. या किल्ल्यांमध्ये प्राधान्याने नाव घ्यावं लागेल ते अंतुरचं. अंतुरला जाण्यासाठी नाशिकहून अगदी सोपा मार्ग आहे. नाशिकहून चाळीसगाव गाठावं. तिथून २० कि.मी. अंतरावर असलेल्या नागद हून सायगव्हाण – औट्रम घाट – नागापूर – कोलापूर – अंतुर असा रस्ता आहे. या प्रवासात औट्रम घाटाची चढाई सुरु होते तिथे गौताळा अभयारण्याचे प्रवेशद्वार आहे.

गर्द अशा वनक्षेत्रातून वळणावळणांच्या रस्त्यावरून जातांना मधूनच वन्यपशूंचे अस्तित्त्व जाणवत राहते. पावसाळ्याच्या या दिवसांत तर या परिसरात जणू स्वर्गच अवतरलेला असतो. नागद ते अंतुर हे अंतर अंदाजे ३० कि.मी. भरतं. कोलापूर गावातून पुढे डाव्या हाताने जाणारा कच्चा पण चांगला असा गाडी रस्ता थेट अंतुर किल्ल्यापर्यंत जातो. या कच्च्या रस्त्यात एका ठिकाणी एक उभा कोरीव स्तंभ दिसतो. त्यावर चारही बाजूंना फारशी भाषेतून मजकूर कोरलेला आहे. हा स्तंभ म्हणजे त्याकाळातला मैलाचा दगड आहे. त्यावर अंतुरपासूनचे चारही दिशांना असलेल्या मुख्य गावांची अंतरं दिलेली आहेत. हा बहुदा भारतात अस्तित्वात असणार्या मैलाच्या दगडांपैकी सर्वांत प्राचीन असावा.

पुढे एका चौथर्यावर अंजनीसूत हनुमंत आपल्याला दर्शन देतात. पुढे गाडी थेट किल्ल्याला जाऊन भिडते. आता आपल्याला कुठलीही चढाई न करता थेट किल्ल्यात शिरायला मिळतं. त्यामुळे अगदी सर्व कुटूंबासकट आपण अंतुरला येऊ शकतो. रस्त्यात वनविभागाने निरीक्षणासाठी पॅगोडे बनविले आहेत. यातून लांबवरचा परिसर न्याहाळतांनाच खालची दरी आणि त्या दरीतून वर उठावलेला, नखशिखांत वृक्षराजीचे हिरवे वस्त्र परिधान केलेला अंतुर डोळ्यांचं पारणं फेडतो. त्याच्या माथ्यावर असलेली सलग तटबंदी आणि गडावशेष लांबूनच मोहून टाकतात. अंतूर किल्ला पूर्व-पश्चिम आणि उत्तर बाजूने खोल दरीमुळे दुर्गम बनलांय तर दक्षिण दिशेने सलग असलेल्या पठारापासून भला मोठा खंदक करून पठारापासून वेगळा करण्यात आला आहे. हे भले मोठे खंदक अभ्यासण्यासारखे आहे. खंदकाच्या अलिकडून उजव्या हाताने थोडं पुढे जात पूर्व भागातून किल्ल्यात जाण्यासाठी पहिलं प्रवेशद्वार लागतं.

इथे पहिल्या प्रवेशद्वाराला लागूनच दुसरं आणि तिसरं प्रवेशद्वारही उभे आहेत. या तीनही दरवाजांतून विविध दिशांनी वळणं घेत गेलो की आपल्याला किल्ल्यात प्रवेश मिळतो. आपल्या लक्षात आलंच असेल की, प्रवेशद्वारांची ही रचना शत्रूला भेदणं सहजासहजी शक्य नव्हती. त्यात प्रत्येक प्रवेशद्वारावर आडवे बांधलेले चिलखती बुरूज, तटबंदी आणि पहारेदाराच्या भव्य खोल्या हा प्रवेशमार्ग अधिकच संरक्षित बनवितात. पहिल्या प्रवेशद्वारावर वर दोन कोनाडे बनवून त्यात शरभ शिल्प ठेवलेले आहेत. पैकी एक शरभ आता अस्तित्त्वात नाही. दुसर्या प्रवेशद्वार कमलपुष्पे, शिल्पाकृती आणि तोफगोळे भिंतीत बसवून सजविलेले आहे तर तिसर्या प्रवेशद्वारावर फारशी भाषेतला अगदी ठसठशीत शिलालेख आहे.



किल्ल्यात प्रवेश करताच संपूर्ण गडमाथ्यावर अनेक वास्तू पसरलेल्या दिसतात. साधारण उत्तरेकडे एक भली मोठी वास्तू नजरेत येते. प्रचंड मोठी असलेली ही वास्तू कदाचित अंबारखाना म्हणून वापरली जात असावी. त्यात दोन तीन मोठी दालनं आहेत. अनेक कमानी, झरोके आणि छत विशेष बघण्यासारखे आहे. थोड्याशा उंचावर एक चौकोनी टेहाळणीची इमारत बनविलेली आहे. आतून भरीव असलेल्या या इमारतीवर चहू बाजूने सुंदर कोनाडे काढलेले आहेत तर वर जाण्यासाठी जीना आहे. छतावर तोफ लावता येतील असे दोन गोलाकार बांधकाम केलेले दिसते. या ठिकाणाहून संपूर्ण अंतुर किल्ल्यावर नजर ठेवता येते. या इमारतीच्या खालच्या बाजूला एक दर्गा असावा अशी वास्तू आहे. ह्यावरही कोरीव काम दिसून येते. थोडं खालच्या बाजूला मध्यभागात भलेमोठे पाण्याचे तळे आहे. तळ्याच्या काठावर एक मशिद असून त्यात दोन शिलालेख कोरलेले आहेत. बहुदा ह्या कुराणातल्या आयत असाव्यात. तळ्याच्या दक्षिणेला एक भले मोठे प्रवेशद्वार असून त्यापूढे उद्ध्वस्त असे वाड्याचे अवशेष आहेत. परंतु ह्या भव्य वाड्याला आताशा वृक्ष वेलींनी घेरून पाडून टाकलंय. अंतुरच्या पश्चिम बाजूला सलग तटबंदी, त्यात सुंदर अश कमानी, पाण्याची बांधीव आणि खांब टाकी तसेच काही उद्ध्वस्त वास्तू आहेत.

एकंदरीतच किती बघावं आणि किती वर्णन करावं अशी स्थिती असतांना अंतुर किल्ल्याचा भरभक्कम दक्षिण भाग खुणावत असतो. किल्ल्याच्या दक्षिणेकडे जातांना एका प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर एक पूर्व-पश्चिम पसरलेली सलग भिंत दिसते. या भिंतीच्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मागे वळून पाहिलं की आपण स्तिमित होऊन जातो. सलग असा भक्कम तट आणि त्याचे दोन अतिभव्य बुरूज, त्या बुरूजांच्या बाहेरच्या बाजूला प्रत्येकी एक छोटा दरवाजा तर मध्यभागी ज्यातून आपण आलो ती प्रवेशद्वाराची भव्य कमान… सर्व आजही अगदी सुस्थितीत.

दक्षिणेकडे असलेल्या खंदकाच्या वरच्या टोकावर आपण पोहोचतो. इथे भरपूर जटील असे बांधकाम आहे. उभ्या अशा जाडजूड भिंतीमधून बोळीसारखे मार्ग आहेत. त्यात एक सुंदर अशी मशिद आहे. पलिकडे टेहाळणीसाठी असणार्या सज्जासारख्या भागातही इथून जाता येतं तसंच इथल्या विविध रचनांमधून पाहिजे तसं हिंडत ही अनोखी रचना अभ्यासता येते.

थेट गाडी मार्ग झालेला असल्याने अंतूर आता पूर्वीसारखा दुर्गम राहिलेला नाही. इथे पर्यटन, वन आणि पुरातत्त्व विभागातर्फे गड संवर्धनाचे उत्कृष्ट काम सुरू आहे. अंतुरच्या माथ्यावरून अजिंठारांगेचे गर्द वृक्षराजीने नटलेले पदर आणि बाकी गौताळा अभयारण्याचा हिरवा नजारा प्रफुल्लित करतो. एकाच किल्ल्यावर जवळपास सर्व प्रकारच्या गडवास्तूंचा खजिना असल्याने ‘अंतुर’ भेट कायमस्वरूपी स्मृतीपटलावर कोरली जाते.
बलाढ्य किल्ले अंतुर
(ता.कन्नड, जि. औरंगाबाद)
⚔ स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान ⚔
------------------------------------------------------------
महाराष्ट्राला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्यामधील असे बरेच किल्ले आहेत कि ज्यांना भरपूर इतिहास आहे, ज्यांची रचना अभेद्य आहे पण काळाच्या ओघात हे किल्ले जास्त लोकांच्या समोर आले नाहीत किंवा त्यांच्याबद्दल माहिती लिहली गेली नाही त्यापैकीच एक बलाढ्य किल्ले अंतुर....!!
महाबुरुजाचा सर्व भाग व त्याखालील गुप्त दरवाजा, खंदक हे पाहून परत आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजात यायचे. गडावर एक तोफहि होती पण काही दळभद्र समाज कंटकांनी ती पळवून नेली हि खरच एक शोकांतिका.
जय शिवराय
जय शंभुराजे
---------------------------------------------------
शिवछावा. मनोज शिवाजीराव महाडिक
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान
कडेगाव(सांगली).
📞9156571313
📞9890354353
Fort Antur
How to reach there :
Antur fort is situated in Kannad taluka of Aurangabad district. To reach the fort you can either alight to Kannad or Chalisgaon.
From Kannad:
You can get ST buses plying towards Kannad from Shivajinagar bust stand in Pune.
Pune-Nagar-Aurangabad-Kannad is the route to reach Kannad. From Kannad, take another bus going towards Silod. You may get local jeeps from the Kannad. The frequency of buses is not so much so if you have private vehicle , it will be well and good. On the way, alight at Nagapur village. Way going besides Warehouse will take you to the fort. Route is well trodden and motorable(not smooth ride though). It is around 3-4 Km from Nagapur.
From Chalisgaon:
Chalisgaon is railway junction. So from Mumbai and Pune, you will get regular trains to reach the Chalisgaon. It is taluka place in Jalgaon district.
From Chalisgaon, catch the ST bus or Local jeep transport to reach Nagad. From Nagad follow the ST buses going towards Silod. Alight at Nagapur. You can either walk till the fort or directly reach at the entrance of fort, if you have private vehicle.
So the routes for Antur fort:
i) Pune-Nagar-Aurangabad-Kannad-Take bus going towards Silod- Alight at Nagapur.[By bus]
ii) Mumbai/Pune-Chalisgaon(on central line)[By train]- Nagad-Saigavhan-small ghat in-between - Nagapur.
What to see:
Image Source: maps.google.com
From Nagapur, after walking 2 Km you will see square pillar bearing a Persian inscription stating that it was
erected in 1588, during the reign of Murtaza Nizam Shah of Ahmadnagar.
Fort is still in good condition. 3 Consecutive entrances are still boasting its mightiness.
![]() |
| 1st Entrance |
![]() |
| 2 nd entrance Go-mukhi type |
![]() |
| 2nd entrance |
![]() |
| 3rd entrance |
![]() |
| Water tanks |
![]() |
| Mosque |
तिथुन दुर्दम्य अश्या रस्त्यावर बाईक मारत-मारत गेलो !! अर्थात त्याची पण एक गंमत च आहे, रस्त्यावर , दुर-दुरपर्यंत चिटपाखरु नव्हते. जाताना एक खांब दिसला, त्यावर कोणती भाषा आहे ते कळेना च. ऊर्दु-सदृश्य आहे.
(जाणकार मिपा-कर सांगतील अशी आशा आहे.)
आणि सरतेशेवटी किल्ला दिसला आणि त्या ही पुढे असे म्हणेन की अजुन खडतर प्रवासाला सुरुवात झाली. एका बाजुला खोल दरी, जंगल आणि नुसती पानांची सळ-सळ झाली तरी भिती वाटावी इतकी भयाण शांतता !!
किल्ल्याचा दुसर्या अंधारलेल्या दरवाजातुन आत शिरलो. वटवाघळांच्या चित्काराने आणि त्या आवाजाचा घुमटाकार दरवाजाच्यामुळे झालेल्या ईको मुळे परिसर दणाणुन गेला, साहजिकच हातात काठ्या घेण्यात आल्या. रॉकेल ची क्वार्टर-साईज बाटली बेल्टच्या लुप मध्ये अडकवली आणि पुढचा प्रवास सुरू केला, त्या आधी घोडे-बांधणी ची जागा, तत्सम आत येणार्या पाहुण्यांची नोंद वा चेकिंग करणारे, खालपर्यंत नजर ठेवणारे दरवाजे आणि काही ठिकाणी कडेबंद करणारी वाट दिसत होती, त्यावरून अंदाज येत होता की हा किल्ला नुसता रहाण्याची सोय नसुन दसरे ही काही आहे..पण का ??? ते मात्र मला शेवटपर्यंत कळाले नाही. अर्थात वर असलेले एक बंदीगृह पाहुन ही मला आश्चर्य वाटले. ( हे माझे काही अंदाज आहेत, नीटसं किंवा त्याला दुजोरा देणारे माझ्याकडे काहीच नाही. )
वटवाघळांच्या चित्काराने दुम-दुमणारे हेच ते गेट (दरवाजा क्रंमाक दोन !! हा दरवाजा मी आलेल्या वाटेतुन...सॉरी पांदीतुन...म्हणजे एका बाजुला दरी आणि वर बूरूज अश्या वाटेतुन ९० अंशातुन !! ) आणि बाहेर येताना.
पुन्हा नव्वद अंशात वळालो, आणि समोर वर पुन्हा पाटी दिसली. आणि पुन्हा नेमकी कुठली भाषा कळेना.
पाटी शिवाय ३०-३५ एकर पसरलेल्या किल्ल्यावर असलेल्या काही दगडांवरच्या खाणा-खुणा, काही अचानक दिसणारी गुहा कम वाट , कुठे थेट जमीनीत घुसणार खंदक, एक छान स तळ ,काही घुमटाकार खोल्या !!
प्या !! हे अजुन दोन अॅन्गल्स
पेर्या !!
http://www.misalpav.com/node/20588
तळ्याकाठुन चालत-चालत वर निघालो आणि या एका खोक्यासारख्या दिसणार्या खोलीने आम्हा सर्वांचे लक्ष वेधले, हळु-हळु तिथवर चालत गेलो, तर पायर्या दिसल्या , पायर्याने वर चढुन गेलो तर वर घुमट होते, आणि घुमटाला एक छोटे छिद्र , त्यातुन आत पाहिले तर संपुर्ण अंधार दिसला, म्हणुन खाली उतरून मागच्या बाजुने जावुन पाहिले...तर ...
फ्लॅश मारून फोटो काढला आणि आत मध्ये शिरणार तेव्हढ्यात, " हुण्ण, हुण्ण " करत आगीनमाश्या घोंघावयाला लागल्या. आत मध्ये शिरण्याच्या काय प्रश्न च नव्हता ! तिथुन सरळ पळुन आलो...खोटं कशाला बोलु !! (मागच्या वेळेस एका आगीन माशीने माझ्या डोक्यावर काटा रूतवला तेव्हा आमचे कलिगंडा सम भासणारे थोबाड पपई सम दिसत होते. तीन दिवस अॅडमीट होतो. )
तिथुन निघुन आलो आणि डोक्याला शॉट लागला, ज्या रस्त्याने आम्ही आलो होतो, त्या रस्यावर एक ही चढ नव्हता. आणि समोर बघतो आहे तर मला संपुर्ण ' चाळीस गाव ' दिसत होते, मान ९० अंशात फिरविली आणि दिसणारी धरणे मोजुन काढली . दहा होती. मी ईतक्या उंचावर कधी आलो तेच कळत नव्हते .
पण वरून दिसणारा नजारा ईथेच संपत नव्हता , तिथुन जरा अजुन डाव्या बाजुला पाहिले तर गौताळ्याची पर्वतराजी दिसत होती. टेहेळणी बुरूजावर दोन क्षण निवांत बसुन काढले.
सरते शेवटी किल्ल्या च्या पहिल्या बुरुजाच्या डाव्या बाजुला शिरलो, तळं मध्यवर्ती धरल तर !! वर एक दर्गाह आहे, एक तोफ पडलेली आहे, भयाण वाढलेली झुडपे आहेत !!
तिथुन तळ्यावर परतलो, बुरुजाच्या ऊजव्या बाजुला अजुन काही गुहा आहेत, थोडं रेस्ट करून मग खाली जावु असे ठरले. तळ्यावर बसलो होतो, अचानक माकडांचा कळप आला. आधी त्यांनी पानी पिवुन घेतले, मग मोर्चा आमच्या कडे वळला, हल्ला च तो. चहु-बाजुने माकडे आणि मध्ये आम्ही !! मशाल पेटवु की फोटो काढु या विवंचनेत असताना, मामा (स्वेटर मधे आहेत ते ! ) म्हणाले चिंचा फेक एका बाजुला, मी तसे केले मग ती माकडे चिंचा फेकल्या त्या दिशेला पळाली आणि आम्ही माकडे उलट दिशेला पळालो. पळताना एक फोटो काढायचा मात्र विसरलो नाही. तिथुन खाली आलो, घड्याळ्यात वेळ पाहिली. चार वाजत आले होते, मामा म्हणाले ' निघुयात आता, तळ्यावर पाणी प्यायला यायचा सर्व जनावरांचा एक टाईम असतो, आणि सर्वात पहिले येतात ती माकडे " तिथुन कलटलो ...आणि त्या तळ्यावर येवुन थबकलो जिथे आधी वाघाने बकरू मारल होते, हात पाय धुतले आणि परतीचा प्रवास सूरू केला.
जाता-जाता : इतिहास पेटवितो, या मताचा मी आहे, अर्थात हे माझं वैयक्तीक मत असले तरी, धर्म, जात, पात, पंथ, वर्ण, वंश आणि त्या अनुषंगाने येणारा गर्व, अहंकार, अभिमान हे सर्व बाजुला सारून जेव्हा मी एखादी अशी वास्तु पहातो, त्याची जडण-घडण पहातो. नैसर्गीक आपत्ती ला तोंड देत वर्षा-नु-वर्षे उभ्या असलेल्या या वास्तु माझ्या धकाधकीच्या दैंनदिन आयुष्यात जगण्याच बळ देतात हे नक्की !!
पुन्हा कधीतरी , माझा मराठवाडा मध्ये ...
१ ) काळदरी : एक मोठी दरी, त्या दरी मध्ये एक घळ !! त्या घळीत वसलेले एक गाव, जिथे सुर्यकिरणांचे अस्तित्व केवळ सकाळी ९ ते ४ असते ( अर्धा तास हिकडे तिकडे !! )
२ ) कायगांव टोक्याची हेमाडपंथी मंदिरे ( ती तिथे काय करताहेत ? ) आणि ' कहार समाजाचे चित्रण


































आळंदी वरून संभाजीनगर / औरंगाबाद ला जाण्याचा मी निवडलेला मार्ग खालीलप्रमाणे होता.
- · आळंदी देवाची (पुणे ) –पेरणे फाटा हून पुणे नगर महामार्ग –अ.नगर –औरंगाबाद – कन्नड शहर –सिल्लोड रस्त्याने – वासाडी गाव –करंजखेड फाटा – करंजखेड गाव – नागापूर –खोलापूर – अंतुर किल्ला
- · अंतुर किल्ला –खोलापूर –नागपूर -- गौताळा अभयारण्य क्षेत्रातून औट्रम घाट उतरून –सायगव्हाण –नागद गाव –महादेव टाका फाटा --- महादेवटाका डोंगर म्हणजेच लोन्झा किल्ला .
- · लोन्झा किल्ला –नागद ते बनोटी रस्त्याने बनोटी गाव – नायगाव –कच्च्या रस्त्याने सुतोंडा किल्ला
- · सुतोंडा किल्ला –नायगाव –बनोटी –सोयगाव –वेताळवाडी गाव – हळदा घाट माथ्यावर वेताळवाडी किल्ला
- · वेताळवाडी किल्ला –हळदा गाव –उंडणगाव –अंभई—नानेगाव— जंजाळा गाव – जंजाळा किल्ला.
* हा पूर्ण मार्ग उलट क्रमाने फिरूनही हे ५ किल्ले बघता येतात.एकूण ३ दिवस पूर्ण असा कालावधी किल्ले बघाण्यास आवश्यक.
* लक्षात ठेवण्यासारखे : गावांदरम्यान चे रस्ते अगदी खराब आहेत .चारचाकी वाहनाने गेल्यास वाहनाची अन आपली हाडं खिळखिळी होणार. दणकट आणि आरामदायक दुचाकी अन तेही गरजेच्या देखभाल साठीचे सर्व हत्यारे ( दोरी, पहाने ,स्क्रूचावी ,पक्कड इ.) सोबत अशी तयारी असावी.
या परिसरात धूळ मुक्तपणे संचार करत असते . नाश्ता ,जेवणखाण स्वत : बनवणे केल्यास उत्तम .हॉटेल्स अपेक्षेला उतरतील असे नाही.कुठेही मुक्कामाची तयारी असू द्यावे.
स्थानिक माणसांशी सुसंवाद साधावा .नक्की मोलाची मदत करतात.वाटाड्या म्हणुंनही.
नागपूर नंतर खोलापूर पासून किल्ला अंतुर च्या दिशेने जाताना खोलापूर गावानंतर पुढ कच्च्या रस्त्याने (वन खात्याने बनवलेला) पुढे जाताना एक ठिकाणी उजव्या बाजूला हा स्तंभ दिसतो.

ह्याच्या चारही बाजूंना अंतुर किल्ल्याच्या चारही बाजूंना असणा-या गावांची नावे त्यांच्या दिशांप्रमाणे त्या त्या बाजूला फार्सी भाषेत लिहिलेली आहेत —

अजून थोडं पुढ गेल कि वाटेच्या उजव्या बाजूला हि मारुतीरायाची मूर्ती दिसून आली


तसंच पुढ जाताना वन खात्याच्या ऑफिस पाशी च्या वळणावर अंतुर किल्ल्याचं पहिलं दर्शन झालं आणि.......

मनात विचार आला ......याचसाठी केला होता अट्टाहास !!.....
तसं इथून अजून पुढ गाडीरस्ता जातो.पण पुढे माणसांची वर्दळ कमी दिसल्यामुळे वनखात्याचे ऑफिसपाशी दुरुस्ती काम करणा-या कामगारांशी थोड्या गप्पा मारल्या .आमच्या जड ब्यागा आणि गाडी तिथं ठेवू देण्यास विनंती केली .तर ते बिनधास्त ठेवून जावा म्हटले.
वेळ .- स.१०:३५ .मोटारसायकल लावली .किल्ल्याचा नकाशा ,माहितीचे कागद ,पाण्याच्या बाटल्या आणि खाऊ सोबत घेतला. आता आम्ही जरा मोकळं किल्याच्या दिशेनं चालू लागलो. किल्ल्याचा नकाशा माहितीसाठी ......सौजन्य -- ट्रेकक्षितीज संस्था संकेतस्थळ.

इथून थोडे पुढे गेलं कि वन खात्याच्या प्यागोडाजवळ पोहोचलो .

वरती बघितल्यास काही बुरुंज दिसतात.त्यात एक तिहेरी बुरुंज लक्ष वेधून घेतो.


दरवाजाच्या कमानीमध्ये वरती कोनाड्यात उजवीकडे एक शरभ शिल्प दिसून आले .
पूर्वेकडे तोंड असलेले हे द्वार .



....तिच्या उजव्या कोप-यातून वर दरवाजाच्या वर जाण्यास पाय-या होत्या ..

आम्ही वर गेलो तर तिथून या प्रवेशद्वारांची रचना बघायला मिळाली ....अप्रतिम !!


......परंतु आजमितीला वृक्षांनी खूप पडझड झालीये ...

.डावीकडे थोडं उंचावर गेल कि एक तलाव दिसला

आणि उजवीकडे २ मोठ्या वास्तू अथवा राजसंकुल दिसलं .आत गेलो तर वटवाघुळांच साम्राज्य ....





आम्ही पाय-यांनी वर गेलो....आणि इथून संपूर्ण किल्ल्याच दर्शन घेतलं.

समोर पाण्याचा तलाव , किल्ल्याच्या दक्षिण बाजुच मध्येच बांधलेली तटबंदी आणि त्याअलीकडे २ उध्वस्त वास्तू आणि शेवटी टोकाला झाडीमध्ये असलेला किल्ल्याचा प्रमुख आकर्षण असलेला भव्य बुरुंज दिसतो ...



तो पाहतो तर काय.........मघाशी टेहळणी बुरुंजावरून पाहिलेली किल्ल्याला दोन भागांत विभागणारी तटबंदी आणि तिचे २ भव्य बुरुंज ,तीच्यामधून अलीकडे पलीकडे जाण्यास असलेली द्वारं.....हे विशाल दृश्य नजरेत सामावून घेतलं .



पाय-या चढून वर गेलो ...आतल्या बाजूला देवड्या आहेत ...
पलीकडे खाली उतरलो ..समोरच एक बाबांचा दर्गा दिसला.इथ आपले मुस्लीम बांधवांची वर्दळ असावी.रंगरंगोटी केलीये.


आणि समोरच पठार आणि हा बुरुंज यांच्या मध्ये असलेला ५० फुटी खंदक......किल्ल्याला भक्कम करण्यासाठी समोरची डोंगर रांग आणि किल्ला यांच्यामधील कातळ फोडून बनवलेला .....

आताशा किल्ला पूर्णपणे बघून झाला होता .त्यामुळे तटबंदी कडेकडेन माघारी पायवाटेने मुख्य प्रवेश द्वाराकडे आलो.

पुनश्च एकदा या ३ प्रवेशद्वारांच स्वागत स्वीकारलं अन निरोप द्यावा अशी विनंती करून बाहेर पडलो....पाय निघत नव्हता



वेळ . दु .२:३०......पुन्हा पुन्हा या किल्ल्याच्या श्रीमंतीचे अनेक पैलू वळून वळून बघतच वाहनतळ ओलांडून कच्च्या वाटेन चालत निघालो .
महाराष्ट्राला लाभलेल्या ऐतिहासिक वारस्यामधील असे बरेच किल्ले आहेत कि ज्यांना भरपूर इतिहास आहे, ज्यांची रचना अभेद्य आहे पण काळाच्या ओघात हे किल्ले जास्त लोकांच्या समोर आले नाहीत किंवा त्यांच्याबद्दल माहिती लिहली गेली नाही त्यापैकीच एक बलाढ्य किल्ले अंतुर....!!
कोल्हापूर प्रांतात असणाऱ्या किल्ले रांगणा सारखाच हाही किल्ला रांगण्यासारखाच भक्कम व बलाढय, याला प्रतिरांगना म्हंटले तर काही वावगे होणार नाही. या किल्ल्याचं खास वैशिट्य म्हणजे हा किल्ला जवळ गेल्याशिवाय दिसतच नाही, म्हणजे याचा फायदा शत्रू बरोबर समोर यायचा आणि किल्ल्यावरून मारा सूरू व्हायचा ज्यामुळे शत्रूची धांदळ उडायची ( किल्ला हा डोंगर रांगेच्या नैसर्गिक रचनेमूळे लवकर दिसत नाही, त्याचा फायदा किल्ल्यावर असणाऱ्या सत्तेला व्हायचा). दुसरी एक महत्वाची बघण्यासारखी गोस्ट म्हणजे रांगण्या सारखाच या किल्ल्यावर तयार केलेला महाबुरुज.......विलक्षण, अप्रतिम, बलाढय व जुंझार.
🎪🎪🎪🎪🎪🚩🎪🎪🎪🎪🎪
गौताळा अभयारण्यामध्ये अंतुर किल्ला असल्यामुळे हा किल्ला दुर्ग भटक्यांसाठी एक चांगली संधी असते, गौताळा अभयारण्याचा परिसर पाहत आपण किल्ल्याकडे चालते व्हावे. औरंगाबाद हुन 65 KM वरती कन्नड हे तालुक्याचे ठिकाण आहे, कन्नड गावावरून आपल्याला नागापूर या गावी 25km वर जावे लागते. नागापूर हुन 4-5KM वर अंतुर किल्ल्याचा परिसर चालू होतो. जाताना आपल्याला एक चौकोनी उभी शिळ रस्त्यावर दिसते ज्यावर पार्शिअन भाषेत शिलालेख कोरला आहे, येथून पुढे गेल्यावर चढावर उजव्या बाजूला हनुमानाची उघड्यावर सुबक मूर्ती दिसते, येतून पुढे सर्व जंगल एरिया चालू होतो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी, पाण्याचे तळे भरपूर पाहायला मिळतील.
आपण 2 डोंगराला वळसा मारून डाव्या बाजूला अचानक आपल्या समोर अभेद्य अश्या किल्ले अंतुर चे दर्शन घडते, बलाढ्य व बेलाग असा हा दिसणारा किल्ला पाहून मन खरेच थक्क होते, किल्ल्याची बांधणी लांबूनच आपल्याला मोहित करते एवढं भक्कम बांधकाम या किल्ल्यावर केलं आहे, या किल्ल्याचा इतिहास सांगतो कि, हा किल्ला 15 व्या शतकात मराठ्यांनी बांधला पण तो 17 व्या शतकात तो अहमदनगरच्या निजामकडे गेला तो अखेरपर्यंत.
किल्ल्याच्या महाबुरुजाच्या उजव्या बाजूने चालत गेल्यावर आपल्याला सुरवातीला डाव्या बाजूला पहारेकर्यांसाठी तयार केलेल्या देवड्या दिसतील, येथून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या भक्कम पहिल्या दरवाजात आपण पोहचतो, आजही येथील दरवाजे भक्कम चांगल्या स्तिथीत आहेत. येतून पुढे गेल्यावर किल्ल्याच्या गोमुखी दुसऱ्या दरवाजात आपण पोचतो, या दरवाजाची निर्मिती अतिशय उत्कृष्टरित्या केली आहे, शत्रू जरी पळत आला तरी त्याला 90० अंशात वळावे लागत असल्यामुळे शत्रूचा वेग व त्वेष कमी व्हायचा. या दरवाज्यावर चक्क तोफेचे गोळेच लावलेले आहेत, तसेच दरवाज्याच्या वर पारशी भाषेत एक शिलालेख कोरला आहे जो आजही चांगल्या अवस्थेत आहे. येतून पुढे गेल्यावर आपण गडावरील पठारावर पोचतो.
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
गडाच्या ऊजव्या बाजूने गडाचे बुरुज व आसपासचा परिसर न्याहाळत आपण गडावरील तलावाजवळ येऊन पोचतो, तलाव हा मोठा असून आजही पूर्ण भरलेला आहे पण यातील पाणी सध्या पिण्यायोग्य नाही. तलावाच्या डाव्या बाजूला काही इमारतींचे अवशेष व एक दरवाजा दिसतो तर उजव्या बाजूला मुस्लिम बांधवांचा पिराची मस्जिद आहे. येतून पुढे टेकडीवर गेल्यावर आपल्याला धान्य कोठार, अंधारबाव(कैद खोली) पाहण्यास मिळते, यापैकी अंधारबाव ची भीषणता आत गेल्यावरच कळते, फक्त एका विटेची जागा आहे ज्यातून सूर्यप्रकाश आतमध्ये येतो......एकदम भयानक. यापासून थोडे खाली गेल्यावर गडाचे पश्चिमेकडील बुरुज व आजूबाजूचा परिसर पाहायला मिळतो. गडाच्या तटबंदीवरून पुढे गेल्यावर आपण गडाच्या मुख्य दरवाजाजवळ पोचतो, येतील 2 बुरुज व त्यातील दरवाजा हे भक्कम बांधकाम पाहायला मिळते, याच्या पुढे लागतो तो महाबुरुज.....गडावरील एक बलाढ्य भाग.
🐅🐅🐅🐅🐅🐅🚩🐅🐅🐅🐅🐅
महाबुरुजाचा सर्व भाग व त्याखालील गुप्त दरवाजा, खंदक हे पाहून परत आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजात यायचे. गडावर एक तोफहि होती पण काही दळभद्र समाज कंटकांनी ती पळवून नेली हि खरच एक शोकांतिका.
बाकी किल्ला खरच बलाढ्य आहे, इतिहास हौसीनी, दुर्गप्रेमीनि तो अवश्य पहावा व स्मरावा. किल्ल्याचे बांधकाम अचूक व युद्धणीतीच्या अनुषंगाने योग्य असे बांधण्यात आले आहे.
🛡🛡🛡🛡🛡🛡⚔🛡🛡🛡🛡
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
---------------------------------------------------
✒माहिती संकलन/ लेखन-
शिवछावा. मनोज शिवाजीराव महाडिक
स्वराज्य योद्धा प्रतिष्ठान
कडेगाव(सांगली).
📞9156571313
📞9890354353
अंतुर किल्ला
यातला आमचा एक जवान हा किल्ला चौथ्यांदा चढत होता. पण मायला गम्मत अशी की, दरवेळी तो वेगवेगळ्या मार्गाने चढल्यामुळे एकाच किल्ल्याकडे जाण्याच्या चार आठ वाटा तो एकच वेळी सांगत होता व दरवेळी, समोर दिसणाऱ्या किल्ल्याकडे बोट दाखवून "हा काय किल्ला.... इथच तर हाये" ... अस सांगत असल्यामुळे......" आठशे खिडक्या नऊशे दार..." असा प्रकार वाटत होता. शाहिस्तेखानाच्या फौजेला पुण्यातून चकवून दुसऱ्या मार्गाने काढणाऱ्या महाराजांच्या सैन्यातील मोहिमेचे नेतृत्व याच जवानाने मागील जन्मी तर केले नव्हते ना असा विचार क्षणभर चमकुन गेला..... पण मग आमच्यातील एकाने ज्या पद्धतीने लाल भडक जंगली गोम एक झटक्यात त्यांच्या बॅगेवरून झटकून दिली त्याच वेगाने मी देखील तो विचार क्षणात झटकून काढला.
आता आम्ही ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलो होतो. इथून किल्ला जवळच दिसत होता. आजूबाजूला सागाचे दाट जंगल लागले होते. आत्तापर्यंत डोक्यावर सतत असलेले उन आता मात्र दाट झाडांमुळे पार दिसेनासे झाले होते. गाड्या लावल्या तेथून इंग्रजी C आकारासारखा प्रवास आम्ही भर उन्हात केल्यामुळे हे घनदाट जंगल सुखद वाटत होत.. भर दुपारच्या उन्हाची तिरीपही त्या जंगलात येत नव्हती हे विशेष. सोबत आणलेले स्नॅक्स व पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होत चालल्याने बॅगांचे वजन ही कमी होत होते.
आम्ही निवडलेला दिवस होता 2 ऑक्टोबर ...ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होती....या वर्षी या भागात चांगलाच पाऊस झालेला असल्याने संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. मोठमोठे गवत वाढलेलं होते. त्यातून मार्ग काढत आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च पॉइंट वर पोहचलो तेथून दिसणारे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे तर होतेच पण आतापर्यंत आलेला सर्व थकवा घालवणारे पण होते....वर येणारे थंडगार वारं उरली सुरली कसर भरून काढणारे होते. या ठिकाणाहून किल्ल्याच्या सर्व बाजूंनी परिसर दिसत होता. पश्चिमेकडील भागात भरपूर प्रमाणात तलाव व पाण्याचे साठे दिसत होते. पूर्वेकडे दुसऱ्या एका डोंगरावरील सपाटीवर दिसणारे छोट्या वस्त्या होत्या.....चोहाबजूने निसर्गाने उधळण केलेली होती. सर्व दृश्य मनात साठवून
............................................
या किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती असे म्हणतात. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. पुढे अंतुरजवळ मुघल सरदार दिलेरखान आणि मराठे ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतुरवरील मुघल आणि पुढे हैदराबादच्या निझामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इसवी सन १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटीयरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. ह्या नोंदीनुसार इसवी सन १८२०च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटीश आणि निझामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतुरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुघल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील गड किल्ले – भाग 1: किल्ले
अजिंठा डोंगररांगेतील दुर्गराज: किल्ले अंतुर
मराठवाड्यातील दुर्गसंपत्तीविषयी अभ्यास करतांना सुरुवात केली ती कंधार, धारुर, उदगीर आणि रामगड-माहुरसारख्या महामहीम दुर्गस्थानांपासून. औरंगाबाद जिल्ह्यातील एखादा किल्ला घ्यावा असा विचार करुन जिल्ह्यात शिरले. अभ्यास करताना लक्षात आले कि दुर्गश्रेष्ठ देवगिरीला दक्खनचे प्रवेशद्वार मानले तर जिल्ह्याची उत्तर सीमा असणाऱ्या अजिंठा-सातमाळा डोंगररांगा ह्या प्रवेशद्वाराची जणू संरक्षक भींतच आणि ह्या डोंगररांगेतील किल्ले म्हणजे भरभक्कम बुरुजांची साखळी. ही साखळी दक्खन भूप्रदेशाचा पहारा अविश्रांत करत आहे. त्यामुळे ह्या आपल्या अभ्यासात इतर भागांमधील ह्या किल्ल्यांची क्रमाक्रमाने दखल घेणे संयुक्तिक वाटले.
औरंगाबाद जिल्ह्यातील आपल्या ह्या लेखमालेतील हा पहिला किल्ला. औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड़ तालुक्यात सुमारे २५ कि.मी. अंतरावरील नागापूर गावाच्या उत्तर दिशेला २०°२५’४३.५” उ. अक्षांश आणि ७५°१४’०७.५” पू. रेखांशांवर तसेच एका डोंगरावर अंतुर किल्ला वसलेला आहे. नागपूर गावाहून अंतुर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी मार्ग केलेला आहे तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या दस्तापूर आणि नागद गावातूनसुद्धा चालत किल्ल्याच्या दरवाजापर्यंत पोचता येते.
इतिहास:
अंतुरचा किल्ला पंधराव्या शतकात कुणा एका मराठा सरदाराने बांधल्याचे सांगितले जाते. परिसरातील इतर किल्ल्यांप्रमाणे अंतुर किल्ल्यांच्या निर्मितीबद्दल ही आपल्याला ह्याहून अधिक माहिती मिळत नाही. नागापूरहून येताना दिसणाऱ्या दगडी खांबावरील दिशादर्शक फारशी शिलालेख, किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजावरील मलिक अंबरचा लेख आणि मशिदीवरील शिलालेख सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला अहमद नगरच्या निजामशाही राज्यात किल्ला होता हे दर्शवितात. पुढे अंतुरजवळ मुघल सरदार दिलेरखान आणि मराठे ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतुरवरील मुघल आणि पुढे हैदराबादच्या निझामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इसवी सन १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटीयरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. ह्या नोंदीनुसार इसवी सन १८२०च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटीश आणि निझामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतुरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुघल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.
स्थापत्य रचना:
सर्व बाजूंनी डोंगराच्या नैसर्गिक उभ्या कातळामुळे ह्या गिरीदुर्गाला भक्कम संरक्षण लाभले आहे. काही ठिकाणी हा कातळ मानवनिर्मित असावा असेही लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात उभी आहे. नागापुरकडून गाडी मार्गाने आले की तिहेरी तटबंदीने अभेद्य झालेला गोलाकार बुरुज आपल्याला दिसतो. डोंगर रांगेतून किल्ल्याला वेगळे करण्यासाठी खिंड खोदून त्यावर हा बुरुज बांधलेला आहे. मुख्य दरवाज्याकडे जाणारी वाट ह्या बुरुजाच्या उजव्या अंगाने जाते. एकमेकांशी काटकोन साधणारे तीन दरवाजे आणि त्या अनुषंगाने वळणावळणाने जाणारा मार्ग किल्ल्याच्या संरक्षण रचनेचा भाग आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरुज आहे तोफा ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते.
प्रवेशाचा मार्ग चढून वर आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बंदिस्त तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला एक कमानीची बांधणी आहे. तलावाच्या उत्तरेला इमारतींचे अवशेष दिसतात. त्यांचे घुमटाकार छत १५-१६व्या शतकातील निझामकालीन वास्तुशैलींशी साधर्म्य दाखवते. किल्ल्यावरील तलावाच्या शेजारील मशीद, दर्गाह व काही थडगी अशा धार्मिक इमारती आहेत. किल्ल्यात प्रवेशापूर्वी ज्या मोठ्या बुरुजाला फेरी मारून आपण दरवाज्याकडे मार्गस्थ होतो त्या बुरुजावर जाण्यासाठी मार्गावर जाताना तळघर असलेल्या इमारतीचे अवशेष आणि एक भव्य दरवाजा पाहायला मिळतो. दक्षिणेच्या ह्या बुरुजामध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि एक पीराचा दर्गाह आहे.
त्याकाळी किल्ल्यावरील पाण्याची गरज मोठा तलाव आणि किल्ल्याच्या डाव्या अंगाला असलेली पाण्याची टाकी भागवत असणार. अनेक इमारतींचे आणि संरक्षण रचनेचे अवशेष इतक्या मोठ्या प्रमाणावर अजूनही अंगावर बाळगून असणारा ह्या किल्ल्याला अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील दुर्गराज असे म्हणून नावाजले जाते.
आज पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या किल्ल्यात अलीकडेच अनेक संवर्धन आणि दुरुस्तीची कामे हातात घेण्यात आली. त्यात बुरुज व तटबंदीची दुरुस्ती, पायवाटा बांधणी, तलावाची दुरुस्ती, दर्ग्यासमोर फरसबंदी, दगडी पटांगण ही कामे प्रामुख्याने होती. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी तळामुळे किल्लेप्रेमींची बरीच सोय झाली आहे. सरकारने किल्ल्यांचे सुनियोजित पद्धतीने संवर्धन, देखभाल करायला हवी आणि आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात हे निश्चितच. पण त्याच बरोबर काही वर्षांपूर्वी घडलेली येथील तोफेच्या चोरीची आणि जवळच्या रानात ती तोफ अर्धी कापलेली मिळाल्याची घटना तसेच किल्ल्यावर विविध ठिकाणी कोरून ठेवलेल्या प्रेमवीरांच्या कथा, प्लास्टिकचा कचरा मात्र मनात प्रश्न उभा करतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याची काळजी फक्त सरकारलाच असावी का… चांगल्या सोयीसुविधा हव्यात हे आपल्याला कळते..पण फक्त सरकारला दोष न देता आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन वागायला कधी शिकणार….??
अंतुरकडे जाताना वाटेत उजवीकडे हा दगडी स्तंभ लागतो. ह्याच्या चारही बाजूंना अंतुर किल्ल्याच्या चारही बाजूस असणा-या महत्वाच्या गावांची नाव त्यांच्या त्यांच्या दिशांप्रमाणे फार्सी भाषेत लिहिलेली आहेत. इथून पुढे गेल्यावर एक मारुतीची मूर्ती आहे. त्याचा फोटो घेता आला नाही.
गाडीरस्ता संपून जिथे अंतुरची पायवाट सुरु होते तिथेच वनखात्याने हा दुसरा "पॅगोडा" उभारला आहे. जेवणासाठी आणि प्रसंगी मुक्कामासाठी कमालीची सुंदर जागा !!!
ह्याच दरवाजात डावीकडे हा झरोका ठेवला आहे. पहिल्या दरवाजातून दुस-या दरवाजाकडे येणारा मार्ग हा ह्याच झरोक्याच्या खालून येत असल्याने शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी ह्या झरोक्याचा वापर केला जायचा असा तज्ञांचं मत आहे.
बाकीचे या ठिकाणी थांबलेले असताना मी एकटाच खाली उतरून आलो आणि खोलापूर गावच्या एका गुराख्याने माझं लक्ष वेधलं. पंचविशीतला तरुण अस्खलित मराठीत कोणाशीतरी फोनवर बोलत होता. त्याचं बोलून झाल्यावर मी त्याला हाक मारली.
"रामराम. कुठून आलात ??"
"हे काय. खोलापूरचे. "
"अच्छा. नाव काय तुझं??"
"शेख लतीफ. मुसलमान आहे मी"
"मग ?? त्याने काय फरक पडतो ??" त्याला मी विचारलं
"तसं नाही. तुम्ही शहराकडची लोकं. मी गावातला मुसलमान आहे म्हणल्यावर माझ्याशी बोलाल का नाही ते माहित नव्हतं !!!"
त्याचं उत्तर विचार करायला भाग पाडणारं होतं. म्हणजे ह्या आधीसुद्धा केवळ धर्मावरून त्याची मदत नाकारल्याचा कटू अनुभव त्याला आला होता !!
"एक काम कर. आम्ही इथे पहिल्यांदाच आलोय. आता तूच आम्हाला सगळा किल्ला दाखव !!!"
क्षणार्धात त्याच्या चेहे-यावरचे भाव बदलले !! कदाचित हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. आमचा हा संवाद सुरु असताना बाकीच्यांनी तटबंदीच्या कडेने गड भटकायला सुरुवात केली होती तर मी एकटाच लतीफशी जास्त वेळ बोलता यावं म्हणून तो दाखवेल तसा किल्ला बघत होतो. हळूहळू त्याने आपल्याकडच्या माहितीचा खजिना उघडायला सुरुवात केली.
"हा जो तलाव दिसतोय ना…तिथे गावात कोणाला जेवण बनवायचं असेल तर ते लोक हव्या असलेल्या भांड्यांची नावं एका कागदावर लिहून तो कागद ह्या तलावात सोडायचे आणि काही मिनिटात त्यांनी कागदावर लिहिलेली भांडी तलावातून वर यायची.त्याच्यात जेवण बनवलं जायचं नंतर नंतर लोकांनी ती वर येणारी भांडी चोरून न्यायला सुरुवात केली. तेव्हापासून अशी भांडी तलावातून वर येणं बंद झालं !!"
स्थानिक लोकांशी संवाद साधण्याचा हा एक मोठा फायदा असतो. बाकी काही मदत मिळो अथवा न मिळो… निखळ मनोरंजन करणा-या अशा दंतकथा मात्र निश्चितच ऐकायला मिळतात. पण एक गोष्ट मात्र इथे कटाक्षाने पाळावी. ती म्हणजे ते सांगत असेलेली माहिती कितीही का अविश्वसनीय,पुरावा नसलेली किंवा अशक्य कोटीतली असू दे…त्यांना ती मुक्तपणे सांगू द्यावी. किल्ल्यांचा ऐतिहासिक पुराव्यांद्वारे अभ्यास करणा-यांपैकी ते नसतात. उलट आपण त्यांचे पाहुणे म्हणून उत्साहाने ते आपल्याला त्यांना माहित असलेल्या गोष्टी सांगत असतात. त्यामुळे मध्येच "ह्या… काहीही काय सांगताय… हे साफ खोटं आहे." वगैरे बोलून त्यांचा हिरमोड करू नये. उलट तुम्हाला योग्य माहिती असेल तर ती त्यांना पटेल अशा भाषेत प्रेमाने समजावून सांगावी म्हणजे सुसंवाद व्यवस्थित साधता येतो.
वर दिलेल्या दरवाजातून आत आल्यावर मागे वळून पाहिलं की दरवाजाची कमानी वास्तू ह्याप्रमाणे दिसते.
पीर (राजवाडा) बघून आम्ही आता परतीचा प्रवास सुरु केला. वरच्या फोटोत दाखवलेल्या तीन दरवाजांच्या तटबंदीतील मधल्या दरवाजातून आपण बाहेर पडलो की पुन्हा आपण अंतुर किल्ल्याच्या मुख्य पठारावर येउन पोहोचतो.
अंतुर किल्ल्यावरचा गुप्त (भूयारी) मार्ग (Secret Passage on Antur Fort , DIst :- Aurangabad)
| बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर |
खंदकात कसे उतरायचे हा आता मुख्य प्रश्न होता. आमच्याकडे ३० फूटी रोप होता, पण वेळ कमी होता. खाली उतरण्यासाठी रस्ता शोधतांना उजव्या बाजूला चक्क कातळात कोरलेल्या ३ पायर्या दिसल्या. त्या उतरून गेल्यावर दरीच्या बाजूने एक चिंचोळी वाट खंदकात उतरत होती. खंदकात उतरल्यावर झुडूपामागे लपलेल्या भगदाडापाशी पोहोचलो.
या भगदाडाच्या वरच्या बाजूस चुन्यात लावलेले दगड दिसत होते.एकेकाळी दगड लावून हे भगदाड बंद केलेले असावे. पूर्वीच्या काळी एक - दोन मुख्य प्रवेशव्दार सोडली तर इतर चोर दरवाजे, भिंती बांधून चिणून टाकले जात असत. भगदाडाची उंची २.५ ते ३ फूट होती. आत मध्ये मिट्ट काळोख होता. पावसाळा असल्याने अशा अंधार्या भागात साप, विंचू असण्याची दाट शक्यता होती. हातात काठी आणि टॉर्च घेऊन भगदडातून आत प्रवेश केला वाट काटकोनात वळून वर चढत होती.
| भूयाराचा अंर्तभाग, अंतुर |
| दगडांमुळे मार्ग बंद झाला होता. |
जिल्हा : औरंगाबाद
उंची : २६४४ फुट
श्रेणी : मध्यम
औरंगाबाद जिल्ह्य़ातील पितळखोरा ते अजिंठा या पूर्व-पश्चिम पसरलेल्या सातमाळ डोंगररांगेत अनेक परीचीत अपरीचीत किल्ले आहेत. महाराष्ट्राचा पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या या जिल्ह्यात मुख्य पर्यटन ठिकाणे व त्यांना जोडणारे काही महामार्ग सोडले तर रस्त्याच्या बाबतीत भयानक स्थिती आहे. त्यामुळे या किल्ल्यांकडे कोणी फिरकत नाही. कन्नड तालुक्यात अंतुर किल्ला हा असाच एक तटबंदी, बुरुज,दरवाजे,कोठारे, पाण्याची टाकी यासारखे अनेक वास्तुअवशेष आपल्या अंगाखांद्यावर बाळगणारा एक सुंदर किल्ला. तीन बाजुला खोल दरी व एका बाजुला मुख्य डोंगररांगेशी जोडलेला हा किल्ला भूदुर्ग व गिरीदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. नागापूर-खोलापूर रस्त्याने गेल्यास आपला थेट किल्ल्यात प्रवेश होतो तर नागद-बेलखेडा-गोपेवाडी या वाटेने अंतूरचा माथा गाठण्यासाठी अडीच तासांची चढाई करावी लागते. अंतुर किल्ल्यास थेट जमीनीवरून भेट देण्यासाठी आपल्याला नागापूर हे किल्ल्याजवळील गाव गाठावे लागते. येथील रस्त्यांची भयानक अवस्था पहाता मुंबई-पुण्याहुन येथे जाताना चाळीसगावमार्गे जाणे हा बऱ्यापैकी पर्याय आहे. चाळीसगाव नागापूर हे अंतर ४२ कि.मी.असुन चाळीसगाव-नागापूर- खोलापुर या मार्गाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते. औरंगाबादहुन आल्यास हे अंतर ९२ कि.मी.असुन औरंगाबाद-वेरूळ-कन्नड मार्गे नागापूर येथे येण्यास २.५ तास लागतात. वाहनांची सोय केवळ नागापूरपर्यंत असल्याने व पुढील किल्ल्याच्या पायथ्याचा रस्ता कच्चा असल्याने स्वतःचे वाहन नसल्यास नागापूर-खोलापुर ते अंतुर किल्ला हे ६ कि.मी.अंतर पायी कापावे लागते पण किल्ला चढण्याचे श्रम वाचुन कमी वेळात गडावर जाता येते. या वाटेने किल्ल्याच्या अगदी जवळ जाईपर्यंत किल्ला आपल्याला दिसत नाही. खोलापूरकडून गडावर जाताना वाटेत एका ठिकाणी ६ फुट उंच चार शहरांच्या दिशा व अंतर दर्शविणारा पर्शियन भाषेत कोरलेला मैलाचा चौकोनी स्तंभ दिसुन येतो. हा स्तंभ इ.स.१६०८ मध्ये बसविल्याचा त्यावर उल्लेख आहे. भारतात अस्तित्वात असणाऱ्या मैलाच्या दगडांतील हा एक प्राचीन ठेवा आहे त्याचे जतन व्हायला हवे. रस्त्याच्या पुढील भागात एका चढावर उजव्या बाजूला उघड्यावर ठेवलेली मारूतीची मुर्ती पहायला मिळते. या वाटेने जाताना शांतता बाळगल्यास वन्यप्राणी आपल्याला दर्शन देऊन जातात. वाटेत वनखात्याने काही ठिकाणी सिमेंटचे निवारे बांधलेले असुन रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यात ३ खोल्या बांधल्या आहेत पण तेथे पाण्याची व इतर सोय नसल्याने त्या निरुपयोगी आहेत. येथुन आपल्याला अंतुर किल्ल्याचे पहिले दर्शन होते. वाटेच्या डाव्या बाजुला असलेल्या टेकडीवर एक गोल घुमट असलेली पुरातन वास्तु दिसते. येथुन काही अंतरावर किल्ल्याकडे जाणारा रस्ता संपतो व पायवाटेला सुरवात होते. किल्ला पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने गडावर खुप मोठया प्रमाणात संवर्धनाचे काम झालेले असुन गडावर जाणारी पायवाट दगडांनी बांधुन काढली आहे. वाटेच्या सुरवातीलाच डाव्या बाजुला आपल्याला किल्ल्याचा भव्य चिलखती बुरुज दिसतो. किल्ल्याचा जमिनीशी जोडलेला हा भाग संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यापासून वेगळा करण्यासाठी या बुरुजासमोर डोंगर उतारावरचा कातळ खोदून १५०x५०x२५ फूट लांबीरुंदीचा खंदक खोदलेला आहे. खंदकाच्या या भागात एक पाण्याचे टाके व चौकीचे अवशेष दिसुन येतात. खंदकाच्या किल्ल्याकडील भागात ५०-६० फुट उंचीच्या कातळावर बुरुज बांधण्यात आलेला असुन खंदकातून बुरुजावर व तेथुन किल्ल्यावर जाण्यासाठी २.५ ते ३ फूट रुंदीचा चिंचोळा भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. या मार्गाच्या वरील बाजुस कातळात पडलेलं भगदाड भिंत बांधून बुजवुन या भिंतीत जंग्या ठेवल्या आहेत. भुयारातुन आत शिरल्यावर वरील बाजुस ५-६ माणसे मावतील इतक्या आकाराची गुहा आहे. गुहेच्या आतुन बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या असुन त्यावर दगड कोसळुन हि वाट बंद झालेली आहे. भुयारी मार्ग पाहुन मागे फिरल्यावर पायवाटेने किल्ल्याच्या दिशेने जाताना वाटेच्या डाव्या बाजूस एक सराई व किल्ल्याच्या तटबंदीतील बुरुज दिसतात. या वाटेने काही अंतरावर किल्ल्याच्या पुर्व बाजूस कड्याला लागुन असलेला किल्ल्याचा पहिला दक्षिणाभिमुख महादरवाजा लागतो. सध्या पुरातत्व खात्याने या दरवाजाला नव्याने लाकडी दारे लावलेली आहेत. दरवाजाबाहेर पहारेकऱ्यांच्या जागा असुन कमानीच्या वरील बाजूस असलेल्या दोन कोनाड्यापैकी एका कोनाड्यात तुटलेले शरभशिल्प आहे. दरवाजाच्या वरील बाजुस कमानीत शत्रूवर मारा करण्यासाठी खाचा बांधलेल्या असुन आतील बाजूस किल्ल्याच्या आधीच्या बांधकामातील दरवाजाच्या खुणा दिसुन येतात. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन येथुन पुढे जाणारी वाट तटबंदीने बंदिस्त केलेली आहे. या तटबंदीत ओवऱ्या असुन तट व दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. वाटेच्या शेवटी पहिल्या दरवाजाच्या काटकोनात बांधलेला गडाचा दुसरा मोठा पुर्वाभिमुख दरवाजा असुन या दरवाजाची व महादरवाजाची बाहेरील रचना जवळपास एकसारखी आहे. दरवाजाशेजारील दोन्ही बाजूचे बुरुज मात्र चौकोनी आकाराचे आहेत. या दरवाजाच्या आतील बाजुस असणाऱ्या देवड्याचा आकार, त्यातील घुमट, कमानी व इतर कोरीव काम पहाता या पहारेकऱ्याच्या देवड्या नसुन या ठिकाणी गडाची कचेरी असावी असे वाटते. दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर सजावटीसाठी कोरीव शिल्प व कमळपुष्पे वापरली असुन या शिल्पाबरोबर तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारची सजावट कोठल्याही किल्ल्यावर दिसत नाही. कदाचित हे तोफगोळे आतील बाजुने फुटलेले असावेत. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर दुसऱ्या दरवाजाच्या काटकोनात बांधलेला गडाचा तिसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाच्या कमानी वरील भागात ५x२ फुट आकारातील बुऱ्हाण निजामशहा याच्या काळातील मलीकअंबर याचा या बांधकामा संदर्भातील पर्शियन भाषेतील शिलालेख आहे. दुसऱ्या व तिसऱ्या दरवाजामधील भागात रणमंडळाची रचना असुन हा भाग चारही बाजुने बंदिस्त आहे. एकमेकांशी काटकोन साधत बांधलेले तीन दरवाजे व त्यातुन जाणारा वळणदर मार्ग किल्ल्याच्या संरक्षण रचनेचा भाग आहेत. तिसऱ्या दरवाजातून आत शिरल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. समुद्रसपाटीपासून २६५१ फुट उंचीवर असलेला साधारण अंडाकृती आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर ३२ एकर परिसरावर पसरलेला असून सर्व बाजुंनी तटबंदीने वेढला आहे. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे एक उध्वस्त वास्तु असुन यात काही कोरीव दगड पडले आहेत. या वास्तूत दुसऱ्या दरवाजाच्या दिशेने एक तळघर असुन तिसऱ्या दरवाजाच्या वरील भागात जायला पायऱ्या आहेत. येथुन ऊजव्या बाजूच्या वाटेने गडाचे बुरुज व आसपासचा परिसर पहात आपण गडाच्या वरील भागात येतो. वाटेच्या वरील भागात उजव्या बाजुला काही घरांची जोती पहायला मिळतात. येथुन गडमाथ्यावर पसरलेल्या अनेक वास्तू दिसतात. उजवीकडे एक टेकडी असून टेकडीच्या डाव्या बाजुला हिरव्या पाण्याने भरलेला भलामोठा तलाव आहे. तलावाच्या एका बाजूस भिंत घालुन पाणी अडविण्यात आले आहे. या भिंतीचा एकुण आकार व बांधकाम पहाता या भिंतीवर गडाची सदर असावी. तलावाच्या डाव्या बाजूला काही इमारतींचे अवशेष व एक दरवाजा दिसतो तर उजव्या बाजूला मस्जिद आहे. टेकडीच्या उतारावर तीन भव्य इमारतींचे संकुल असुन या इमारतींच्या आवारात जाण्यासाठी एक लहानसा दरवाजा आहे. यातील दोन इमारती एकमेकाशी जोडलेल्या असुन एक इमारत मात्र वेगळी आहे. या इमारतीचे छप्पर मोठया प्रमाणात ढासळलेले असुन इमारतीच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या इमारती म्हणजे गडावरील अंबरखाना म्हणजेच धान्याचे कोठार व शस्त्रागार असावे. या इमारतीत मोठमोठी दालनं असुन अनेक कमानी व झरोके आहेत. टेकडीच्या सर्वोच्च माथ्यावर टेहळणीसाठी एक भलामोठा चौकोनी बुरुज बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी मागील बाजुने पायऱ्या आहेत. या बुरुजाच्या चारही बाजूने सुंदर कोनाडे काढलेले असुन वरील बाजूस तोफा ठेवण्यासाठी दोन गोलाकार कठडे बांधलेले आहेत. या बुरूजावरुन संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते व अंजठा-सातमाळा रांगेतील खुप लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. या बुरुजाच्या खालील बाजूस टेकडीच्या उतारावर एक कोरीव काम केलेली दर्ग्यासारखी वास्तु दिसुन येते. या वास्तुच्या मागील बाजूस एक भलामोठा चौथरा असुन या चौथऱ्यावर सात-आठ थडगी दिसुन येतात तर खालील बाजूस तलावाच्या काठावर बुऱ्हाण निजामशहा याच्या काळात बांधलेली मशीद असुन या मशिदीच्या भिंतीवर दोन कुराणातील आयत कोरलेले शिलालेख आहेत. मशिदीच्या मागील बाजूस एक लहानसे तळघर असुन या भागात पावसाचे पाणी तलावात येण्यासाठी बांधलेल्या भूमिगत दगडी नाली दिसुन येतात. मशिदीसमोर तलावाच्या बाजुला एक कमानीदार भव्य दरवाजा असुन या दरवाजाच्या मागील बाजूस पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. दरवाजाच्या वरील बाजूस तलावातील पाणी वर खेचण्याची सोय असुन तेथुन खापरी नळाच्या सहाय्याने हे पाणी येथील वाड्यात फिरवले आहे. हे पाहुन पुढे जाताना वाटेत जमिनीलगत एक दरवाजा दिसतो. हा दरवाजा म्हणजे वाड्यात असलेले भूमिगत तळघर असुन वाडा कोसळल्याने ते उघडयावर पडले आहे. तळघराच्या पुढील भागात असणारी वास्तु गोदी दर्गा म्हणुन ओळखली जाते. या वास्तुच्या मागील बाजूस एक कोरडा बांधीव तलाव आहे. तलाव पाहुन पुढे आल्यावर एका मोठया बुरुजावरून एक पायऱ्याची वाट खाली उतरताना दिसते. या वाटेने संपुर्ण किल्ल्याला फेरी मारता येते. वाटेच्या सुरवातीला खडकात खोदलेली एकुण सहा पाण्याची टाकी दिसुन येतात. यातील दोन टाकी बुजलेली असुन चार टाक्यात पाणी आहे पण केवळ एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या तटबंदीच्या कडेने संपुर्ण गडाला फेरी मारल्यास तटबंदीमधील २२ बुरुज मोजता येतात. यातील एका बुरुजाच्या माथ्यावर घुमटी बांधलेली आहे तर एका बुरुजात पहारेकऱ्यासाठी देवड्या बांधल्या आहेत. या तटबंदीत एका ठिकाणी चोर दरवाजा असुन तेथुन दोरी लाऊन खाली उतरता येते. काही ठिकाणी तटबंदीच्या खालील बाजूस खंदक खोदलेला असुन तेथुन वर चढणारी वाट बंद करण्यात आली आहे तसेच या खंदकात जमा होणारे पाणी वर खेचून घेण्याची सोय करण्यात आली आहे. हे सर्व किल्ल्याला फेरी मारल्यास पहायला मिळते अन्यथा पाण्याची टाकी पाहुन मागे फिरावे व दक्षिण दिशेच्या चिलखती बुरुजाकडे निघावे. गडाचा दक्षिण भाग एखाद्या बालेकिल्ल्याप्रमाणे मुख्य गडापासून तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे असुन मध्यभागी असलेल्या मोठया दरवाजाच्या बाहेरील बाजुने तटावर जाण्यासाठी जिने आहेत तर आतील बाजुने दोन मोठे बुरूज आहेत. गडाचा हा भाग डोंगररांगेशी जोडला गेला असल्यामुळे आपण सुरवातीला पाहिलेला मोठा खंदक येथेच कोरलेला आहे. या बाजूला खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे. बुरुजाखाली असलेल्या या चिलखती भागात उतरण्यासाठी बुरुजाच्या दोन्ही बाजूस दोन दरवाजे आहेत. बुरुजाखाली असलेल्या एका खोलीतुन किल्ल्याबाहेर जाण्यासाठी चोर दरवाजा आहे पण त्याचे खालील बाजूचे बांधकाम कोसळलेले आहे जे आपल्याला बाहेरून आत शिरले असता पहायला मिळते. बुरुजाच्या खालील बाजूस सैनिकांची निवासस्थाने आहेत.बुरुज चारही बाजुने बंदिस्त असुन समोरील बाजुने बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या व दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या असुन बुरुजावर गैबनशहा या सुफी संताची कबर आहे. बुरुजावरुन समोरचे पठार व दूरवरचा भूभाग नजरेस पडतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. अंतुर किल्ल्यावर मोठया प्रमाणात अवशेष असल्याने संपूर्ण किल्ला व्यवस्थित पहायला चार तास लागतात. किल्ल्याचा इतिहास पहाता हा किल्ला १५ व्या शतकात यादवकाळात बांधला गेला असावा. यादव काळात कान्हा नावाचा सरदार अंतुर किल्ल्याचा किल्लेदार असता अल्लाउद्दीन खिलजीचे किल्ल्यावर आक्रमण झाले. या आक्रमणात किल्लेदार त्याच्या कुटुंबासहित मारला गेला. त्यांच्या या बलिदानामुळे या गावाला कन्नड नाव पडले असावे असे इतिहासकारांचे मत आहे. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला निजामशाही वजीर मलीक अंबरच्या काळात किल्ल्यावर मोठया प्रमाणात बांधकामे झाली. नागापूरहून येताना वाटेत असलेला दगडी खांबावरील दिशादर्शक पर्शियन शिलालेख, किल्ल्याच्या दरवाजावरील आणि मशिदीवरील शिलालेख या बांधकामाचा काळ दर्शवितात. अंतुरजवळ मराठे आणि मोगल सरदार दिलेरखान ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेख आढळतात. इ.स.१८८४ मधील औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयरमधील नोंदीनुसार १८१८ च्या सुमारास इंग्रज-निजाम संयुक्त सैन्यापुढे अंतुर किल्ल्याचा पाडाव झाला व हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
















































































































































10 comments: