औरंगाबाद जिल्हा पर्यटनाची राजधानी असला आणि या जिल्ह्यात बरेच गिरीदुर्ग असले तरी औरंगाबाद जिल्हा फोडून स्वतंत्र जिल्हा म्हणून निर्माण झालेल्या जालना जिल्ह्यात असलेला पाच गडकोट आहेत.त्यापैकी एकमेव गिरीदुर्ग असलेला रोहिलागड नावाचा दुर्लक्षित किल्ला या नक्कीच पहावा असा आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहीलागड नावाचे एक लहान खेडेगाव आहे. या सपाट प्रदेशात उंच सलग अशी डोंगररांग नाही आहे. छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत. अशाच एका टेकडी वजा डोंगरावर रोहिगड किल्ला आहे. अवतरणचिन्हासारखा आकार असलेल्या छोट्या डोंगरावर औरंगाबाद शहरापासून सुमारे ५० किलोमीटरवर अंबड तालुक्यात हा किल्ला वसलेला आहे.किल्ल्याच्या पायथ्याचे गाव रोहिलगड याच नावाने ओळखले जाते. गावामागे एका मध्यम आकाराच्या डोंगरावर असलेल्या या किल्ल्याची निर्मिती नेमकी कोणी केली हे माहित नसले तरी डोंगराच्या अर्ध्या उंचीवर खोदलेली लेणी या किल्ल्याचे प्राचीनत्व अधोरेखीत करतात. गावात सापडणारे मंदिरांचे अवशेष तसेच देवगिरी, पैठण, अंबड, जामखेड या यादवकालीन बाजारपेठांना जोडणाऱ्या मार्गावरील स्थान पाहता गावाचा यादवकालीन संबंध अधोरेखित करता येऊ शकतो. अंबड देवगिरी हा व्यापारी मार्ग या गावाजवळुन जात असल्याने या भागात असलेला हा एकमेव डोंगर पहाता या मार्गाचे रक्षण करण्यासाठी रोहीलागड किल्ल्याची उभारणी करण्यात आली असावी. मात्र, गाव आणि किल्ल्याच्या निर्मितीविषयी याहून अधिक इतिहास अजूनही मौन बाळगून आहे. लहुगडसारखा रोहिलागड किल्ल्याचा वापर ही देवगिरी किल्ल्याच्या संरक्षक फळीतील टेहळणी आणि पहाऱ्याचे स्थान म्हणून वापर होत असावा. त्यानंतरच्या मुस्लिम राजवटीच्या काळातील इथल्या इतिहासाविषयी काहीच पुरावा मिळत नाही.
मंदिरा शेजारून रोहिलागड गावाकडे जाणारा कच्चा रस्ता व उवीकडे किल्ला
रोहिलागड नावावरून या गडाचा रोहिले या पश्तुनी अफगाण लोकांशी संबंध असावा हे असे काही अभ्यासक मानतात. १६ आणि १७ व्या शतकात अफगाण प्रांतातील अनेक पश्तूनी पठाण टोळ्या औरंगजेबाने राजपूतांशी लढायला वापरल्या आणि त्यानंतर या पश्तुनी प्रांतातील लोकांचा भारतात प्रवेश झाला व त्यांची ओळख“रोहिले” म्हणून झाली. आजच्या उत्तर प्रदेशातील बरेली शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशात वसवले. हा भाग आज रोहिलखंड म्हणूनच ओळखला जातो.अफगाणिस्तानातील कमालीच्या शुष्क डोंगरदऱ्यांमधील शूरवीर लढवय्ये म्हणून हे रोहिले त्यानंतर भारताच्या इतिहासात गाजले. विविध लढायात त्यांचा वापर केला गेला. या पठानांचा रोहिलखंड हा उत्तरप्रदेशात स्वतंत्र भाग निर्माण केला.१७६१ मधील पानिपतच्या लढाईत रोहिले मराठ्यांच्या विरुद्ध लढले आणि त्याचा बदला नंतर शूर महादजी शिंदे यांनी रोहिलखंड लुटून आणि रोहिल्यांना लढाईत हरवून घेतला. “रोहिले” हे फक्त पठाण नसून राजपूत पण आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी "रोहिले" लोक आजही राहतात.मात्र मराठवाड्यातील या भागातील त्यांचा इतिहास अजून तेवढासा ज्ञात नाही. तसेच या गडाशी खरोखरच रोहीले लोकांचा काही संबंध आला कि नाही याचीही खात्री लायक माहिती नाही.स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार गावाला जे रोहिलागड नाव आहे त्याच्या विषयी असे सांगितले जाते की या डोंगरावरील गडाचे बांधकाम अर्धवट राहिले म्हणून त्यास राहिलेलागड म्हणजेच रोहिलागड असे म्हणतात किल्ला अत्यंत पुरातन असवा. निदान तो देवगिरी राज्याची भरभराट होण्या आधीचा किंवा सोबतचा नक्कीच असावा. सातवाहन काळातील असण्याची शक्यता आहे हे किल्ल्यावरील लेण्यांमुळे लक्षात येते. किल्ल्याचे प्राचीन नाव दुसरे असावे. रोहिला गड हे नाव रोहिले लोकांनी किल्ला हस्तगत केल्यापासून पडले असावे.
जावे कसे ?
जालना शहर रस्ताने आणि रेल्वेने सर्व शहरांशी जोडलेले आहे. जालना- अंबड रस्त्याने जालना रोहीलगड अंतर ४० किलोमीटर अंतरावर आहे. रोहिलगडला जाण्यासाठी जालन्याहून थेट एसटी सेवा नाही. जालन्याहून एसटीने अंबड गाठावे. अंबडहुन रोहिलगडला जाण्यासाठी दिवसातून ठराविक वेळेला एसटी बसेस आहेत. (बसचे वेळापत्रक खाली दिलेले आहे.) खाजगी वहानाने जालन्याहून अंबडला न जाताही थेट रोहिलगडला जाता येते.
रोहीलागड गाव औरंगाबादहुन ४० कि.मी. तर जालन्याहुन ३५ कि.मी. अंतरावर असुन औरंगाबाद-बीड महामार्गावरील रोहिलागड फाट्याहुन ७ कि.मी. आत आहे. उन्हाळा सोडल्यास कधीही रोहिला गड पाहण्यासारखा आहे. गड आणि गाव पाहायला तीन तास पुरतात. औरंगाबाद बीड रोडवर अडूळ नंतर एक रस्ता अंबड साठी वळतो. त्याच रस्त्यावर रोहिलागड आहे. तसेच जालनावरुन येताना अंबड मार्गे येत येते.
जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने औरंगाबादकडून येत असाल तर औरंगाबाद-बीड महामार्गावर रोहिलागड फाट्यातून आत ५ किमी रोहिलागड गाव आहे. जालना कडून येत असाल तर जालना-अंबड महामार्गावर हॉटेल सुखसागर पाशी रोहिलागड फाटा आहे तेथून १६ किमी रोहिलागड आहे. रोहिलागडला बसने सुद्धा येत येते.
बसचे वेळापत्रक
अंबंड ते रोहीलागड : सकाळी ७,१,३,६
रोहीलागड ते अंबंड : सकाळी ८.३०,२.४.१५,७

गावात शिरताना वाटेतील महादेव मंदिराबाहेर काही कोरीव शिल्प व मंदिराचे घडीव कोरीव खांब नजरेस पडतात. रोहिलगड गावातून जालन्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून जवळच “फिरंगीमाता मंदिर” आहे.
कच्च्या रस्त्यालगत असणारे फिरंगी मातेचे मंदिर
रोहिलागड किल्ला टेकडीवजा डोंगरावर आहे. किल्ल्यावर गावातून आणि बायपास रस्त्याने फिरंगी देवी मंदिराशेजारून जाता येते. किल्ल्यावर जाण्यासाठी कोठूनही चढाई करता येते. देवळापासून किल्ल्यावर जायला १५-२० मिनिटं पुरतात.
किल्ला आणि बाजूची टेकडी यांच्या मधून गावातून येणारा कच्चा रस्ता जातो. या रस्त्याने रोहिलगड किल्ल्याचा डोंगर आणि टेकडी मधील घळीत येऊन किल्ला चढायला सुरुवात करावी. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर शेतं आहेत. पायथ्यापासून येथे पोहोचण्यास १० मिनिटे लागतात.
नकाश्याद्वारे रोहिलागडावरील आमच्या भटकंती मार्ग व किल्ल्यावरील वास्तू अवशेष दाखवण्याचा एक प्रयत्न
या ठिकाणी डावीकडे वळून ५ मिनिटे चालल्यावर कातळात कोरलेली गुहा आहे. ह्या किल्ल्याचा माथा बऱ्यापैकी सपाट असून त्याचा आकार साधारणपणे लंबुळक्या बदामाच्या आकाराचा आहे. फिरंगीमाता मंदिरापासून निघाल्यावर आपण ह्या किल्ल्याच्या बदामाच्या खालच्या टोकाला पोचतो. इथून खाली रोहिलगड गांव तर डावीकडे लागुनच एक किल्ल्याच्याच उंचीचा पण आकाराने जास्त पसरलेला "पालखा" नावाचा डोंगर दिसतो.किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या लेण्यासमोरील सपाट जागेत गावकरी शेती करत असल्याने गावातुन या लेण्यापर्यंत जाण्यासाठी मळलेली वाट आहे. लेणी समोर सपाट जागा असल्याने गावकर्यांनी तेथे शेती करण्यास सुरुवात केली.
गावातुन १५ मिनिटात आपण या लेण्यापर्यंत पोहोचतो. डोंगरावरून वाहुन आलेल्या दगडमातीमुळे लेण्याचा दर्शनी भाग मोठया प्रमाणात बुजलेला आहे. अर्धवट कोरलेले हे लेणे बऱ्यापैकी मोठे असुन लेण्याचे छत ११ खांबावर तोललेले आहे.
सर्व स्तंभ सारख्याच आकाराचे असून तळात ते चौकोनी मध्येभागी षट्कोनी तर वरचा भाग गोलाकार कोरलेला आहे सर्व स्तंभ आडवे उभे एका रेषेत दिसतात लेणीत कुठेच मूर्ती लेख किंवा इतर नक्षीकाम केलेले नाही लेणीत एका बाजूच्या भिंतीत तीन लहान मोठ्या आकाराच्या देवळ्या कोरलेल्या असून एका लहान देवळीत मागच्या बाजूस मूर्ती सारखा आकार असलेल्या ठिकाणी सेंदूर लावलेला आहे स्थानिक लोक याची मारुती म्हणून पूजा करतात
लेणीच्या एका बाजूला तळामध्ये एक आयाताकृती आकाराचा कोरीव बोगदा दिसतो असे सांगतात की हा एक पायऱ्या असलेला भुयारी मार्ग आहे तो आज पूर्णपणे बुजून टाकलेला आहे याबाबतीत एक अख्यायिका ऐकायला मिळाली ती अशी एक मेंढपाळ मेंढ्या चारत असताना तेथे लांडगा आला ते पाहून त्याने मेंढया लेणीत घुसवल्या.त्यापैकी बर्याच मेंढ्या त्या भुयारात शिरल्या.जस जस मेंढ्या चालत गेल्या तस मरत गेल्या.शेवटी एक मेंढी दौलताबाद येथील एका तोफेपाशी पोहचली पुढे त्या तोफेचे नाव मेंढीतोफ असे ठेवले.असे गावकरी सांगतात. या लेणीचे काम अर्धवट झालेले दिसते त्याच्या अनेक खाणाखुणा आतमध्ये आहेत लेणी ज्या खडकात खोदली तो ठिसूळ आहे असे दिसते
लेण्याच्या दर्शनी भागात खडकात खोदलेले पण सद्यस्थितीत बुजलेले एक पाण्याचे टाके आहे. या टाक्यात उतरण्यासाठी लेण्याच्या आतील बाजुस पायऱ्या कोरलेल्या आहेत. लेण्याच्या एका अर्धवट कोरलेल्या देवडीत उगीचच शेंदुर फासलेला आहे. या लेण्याशेजारी अजून एक मोठे लेणे लेणी असुन या लेणीमुखावर मोठया प्रमाणात दगडमाती पसरल्याने हे लेणे आतून पहाता येत नाही. लेण्यापासून गडमाथा केवळ काही फुट उंचीवर असुन त्यावर चढाई करण्यासाठी दोन वाटा आहेत. एक वाट लेण्याच्या माथ्यावरून सरळ वर चढत जाते तर दुसरी वाट लेण्याच्या डावीकडुन डोंगराला वळसा घालत वर चढते. समोरील चढ दिसायला सोपा असला तरी त्यावर असलेल्या मुरमाड मातीने अनेकदा घसरायला होते. यामुळे शक्यतो दुसऱ्या वाटेने जावे शिवाय दुसऱ्या वाटेने गेल्यास या वाटेच्या वरील भागात असलेले खडकात खोदलेले गुहेवजा भलेमोठे कोरडे खांबटाके पहायला मिळते.
या टाक्याच्या दर्शनी भागात दोन खांब असुन आतील भागात असलेले खांब मात्र पूर्णपणे कोसळले आहेत. मुळात कमी पाऊस असलेल्या या भागात तसेच ठिसुळ दगड असल्याने या टाक्यात पाणी टिकून राहणे ही कठीण गोष्ट आहे व कदाचीत याचमुळे हा किल्ला ओस पडला असावा.
येथुन पुढे आल्यावर रचीव तटबंदीचे अवशेष पहात आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. तेथून वर गेल्यावर भगवा झेंडा लागतो. झेंड्यापाशी गेल्यावर चढाई पूर्ण होते. झेंड्याजवळून गडाची संपुर्ण सपाटी दिसते.आपण प्रवेश करतो त्याशेजारी डाव्या बाजुस एक उंचवटा आहे. बुरुजासारखा दिसणारा हा भाग म्हणजे किल्ल्यावरील सर्वात उंच भाग असुन या उंचवट्यावर एका वास्तुच्या बांधकामाच्या भिंती पहायला मिळतात.त्याबाबत गावकरी असे सांगतात कि गडावर खूप मोठा वाडा होता.परंतु गावकर्यांनी त्या वाड्याचे दगड काढून घेऊन पुढे मंदिरे,घरे,घराचे जोते बांधले आहे.आज पण गावातील प्रत्येक घराला गडावरील दगड आहे.
येथुन आपल्याला संपुर्ण किल्ला एका नजरेत पहायला मिळतो. साधारण त्रिकोणी आकार असलेला किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून २०७० फुट उंचावर असुन किल्ल्याचा परीसर ५ एकरवर पसरलेला आहे. वाड्याजवळच एक पाण्याच्या टाकीचे अवशेष दिसतात.ती सद्यस्थितीला बुजलेली आहे.किल्ल्याचे दक्षिणेकडील टोक म्हणजे ४५० फुट लांब व ७५ फुट रुंदीची डोंगरसोंड आहे.
या उंचवट्याच्या उजव्या बाजुस सपाटीवर आपल्याला नाणेघाटाची आठवण करून देणारा दगडी रांजण पहायला मिळतो.पण या रांजणाचा खालील तळ मात्र फुटलेला आहे.देवगिरी-अंबड या मार्गाचा वापर करणाऱ्या व्यापारांकडून त्याकाळी कर म्हणून घेतलेले नाणी किवा रक्कम या रांजणात गोळा केली जात असावी. त्या शेजारीच गडावरील एकमेव बुरुज दिसतो.त्या बुरुजाचे नाव आग्नेय बुरुज होते.
या भागात हा डोंगर सर्वात उंच असल्याने या बुरुजावरून आसपासचा संपूर्ण परिसर दिसतो.पूर्वेकडे अंबड,अग्नेयेकडे जालना आणि पश्चिमेकडे औरंगाबादचा काही भाग अस संपूर्ण दिसतात. येथुन डाव्या बाजुने म्हणजे रोहिलागड गावाच्या विरुद्ध दिशेने असलेल्या किल्ल्याच्या तटावरून गडफेरीस सुरवात करावी.
वाटेच्या सुरवातीला खडकात खोदलेले पाण्याचे खांबटाके असुन यात खांब असलेल्या भागात मोठया प्रमाणात माती साठलेली आहे तर बाहेरील भागात मोठया प्रमाणात काटेरी झाडी वाढलेली आहे. थोडीशी कसरत करत या झाडीतुन टाक्यात उतरल्यावर या टाक्याचा आतील खांब असलेला भाग पहायला मिळतो. पावसाळा वगळता यात पाणी नसते. त्यामध्ये मुले पोहण्याचा आनंद लुटतात.या टाक्याजवळ दुसरे कोरडे पडलेले साधे टाके असुन त्यात देखील झाडी वाढलेली आहे.तेथून उत्तरेकडे खाली उतरून गेल्यावर एक लेणी लागते.त्या लेणीतील खांब पडलेल्या अवस्थेत आहे.त्या लेणीत एक भुयार आहे.ते वर वाड्याकडे जाते.
तेथून जवळच एक खोल भाग दिसतो.त्या गड्ड्यात लेणी आहे.लेणीत शिरल्यावर हॉल दिसतो.ती थोडी बुजलेली आहे.त्या लेणीत एकूण चार भुयार आहे.त्या भुयार थोडे पुढे बुजलेले आहे.त्या लेणी शेजारीच पाण्याचे कोरडे टाके आहे.तेथून वर गेल्यावर पुढे तटबंदी आहे.ती चांगल्या स्थितीत आहे.तेथुन खाली उतरल्यावर पायवाटेने जात असताना एक पाण्याचे कोरडे टाके लागते.किल्ल्याचा उर्वरित माथा म्हणजे पठार असुन या पठारावर मोठया प्रमाणात दगड विखुरलेले आहेत. गावाच्या दिशेने असलेल्या या टोकावर भगवा झेंडा रोवलेला आहे. येथुन संपुर्ण रोहीलागड गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. येथुन सुरवातीला वर्णन केलेल्या वाटेने खाली लेणीकडे उतरता येते अथवा आल्या वाटेने परत जावे हे उत्तम. संपुर्ण गड फिरून परत जाण्यास तीन तास पुरेसे ठरतात. किल्ल्यावर राहाण्याची,जेवणाची सोय नाही.मात्र गावात आधी कल्पना दिल्यास होउ शकते.तसेच किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.तेव्हा सोबत पाणी ठेवणे आवश्यक.
पायथ्याचे गाव आणि वैशिष्ट्ये :
रोहिलागड हे गाव छोट्या तटबंदीच्या आत वसलेलं होत असं गावातील लोक सांगतात. आजदेखील चारी दिशांना दगडी वेस पहावयास मिळते. या वेशीत बसवलेला शिलालेखाचा फोटो आणि त्याचे वाचन खाली देत आहे.
गावात भव्य दगडी मंदिर असावे. अनेक शिल्प गावात विखुरलेले आहेत. ते पाहण्यासाठी पूर्ण गाव पायी फिरून पाहावे लागते. या सर्व शिल्पांना एकत्र करण्याचा विचार गावातील तरुण मंडळी करू पाहत आहे जे अत्यंत कौतुकास्पद आहे.
गावतील मारुती मंदिरापाशी अनेक देवतांची शिल्प आहे. तेथे एक गोल आकाराचा दगड आहे.तो दगड गावातील मल्ल व्यायामासाठी वापरत असत.गावतील प्रत्येक मंदिरापाशी अनेक मुर्ती व शिल्पे आहे.
देवीच्या मंदिरा जवळ पाचीन मंदिराचे दगडी स्तंभ पडलेले दिसतात तर काही स्तंभ मातीत गाडले गेले आहेत या गावात कुठे तरी प्राचीन मंदिर असावे जे कालौघात नष्ट झाले असावे असे वाटते. स्तंभावरील व चिऱ्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे एका स्तंभावर दोन हत्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेने पुढचे पाय वर करून दोघांनी मान फिरवुन सोंडी एकमेकात अडकवल्या असून पाठीवर कलश आहे त्यावर श्रीफळ आहे दुसरे असे की,एक आई आपल्या बाळाला मांडीवर बसवुन स्तनपान करताना दिसते तर तिसरी मूर्ती अशी दिसते की महादेव मंदिराच्या गर्भ गृहातील प्रवेश द्वाराच्या खालच्या दोन्ही बाजूस जसे व्याल असतात तसाच एक व्याल आहे
इतर हि बरेच नक्षीकाम केलेले आहे ह्या सर्व कोरीव मूर्ती एकाच स्तंभावर असून तो स्तंभ चौकोनी षट्कोनी व गोलाकार आहे बरेच चिरे मारुती मंदिर व इतर मंदिरांना लावलेली दिसली हे मंदिर नेमके कोणत्या कालखंडात निर्माण झाले असावे असा प्रश्न पडतो? कोणत्या देवतेचे मंदिर होते हे सांगणे कठीण आहे इतरत्र अनेक अवशेष पडलेले दिसतात तसेच गावात बारव होती,मात्र त्याला पाणी नसल्यामुळे ती बुजवली गेल्याचे समजले.
गावात अनेक वीरगळ सापडत असतात.गावात अनेक वेशी होत्या.त्यापैकी जशी त्या काळात होती.तशी फक्त एक उरलेली आहे.ती सुस्थितीत आहे. तसेच गडावर असलेल्या राजंणासारखेच अनेक रांजण गावात पहायला मिळतात. असे सांगतात की लोकांनी ते डोगरावरून खाली आणले आहेत. याशिवाय गावाजवळ अनेक शेतात पांढर आहेत.पांढर म्हणजे पांढर्या मातीचा उंचवटा,बहुतेकदा या उंचवट्याखाली प्राचीन अवशेष सापडतात.आजही खुप गावकर्यांना असे अवशेष सापडलेले आहेत.गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.पण या वारसाचे जतन होणे महत्वाचे आहे.
गडाची जरी फारशी माहिती आजमितीस उपलब्ध नाही तरी त्यावर संशोधन होणे आवश्यक आहे. इथे असलेल्या अवशेषांसाठी हे ठिकाण आवर्जून पाहण्यासारखे आहे. ऐतिहासिक स्थळांची होणारी उपेक्षा यावर तर न बोलणे अधिक योग्य.अर्थात सुखद बाब अशी कि गावातील तरुण मंडळी या ठिकाणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. गडावरील काही ठिकाणांचे संवर्धन देखील विशाल टकले व त्याच्या साथीदारांनी केले आहे.गडाला जायला एखादी चांगली वाट करावी, लेण्यामधील काटेरी झाडे कापून माती उपसायची देखील हे तरूण नियोजन करीत आहेत. तुम्ही गड पहायला गेल्यास विशालला फोन करावा, तो नक्कीच तुम्हाला मदत करेल. खरतरं या मित्रांच्याच पाठपुराव्याने हि सर्व माहिती आपणासाठी सादर करू शकलो.गावातील गडमित्र श्री. विशाल टकले याचा फोन नं ७५१७८९४६५०.विशाल यांनीच गडाची माहिती देणारी https://rohilagad.site123.me/ हि वेबसाईट बनवली.तिथेही तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल.
इतर पाहण्यासारखी ठिकाणे :
रोहिलागड पाहून झाल्यावर ५ किमी अंतरावरील जम्बुवन्ताचे पुरातन मंदिर आहे. हे भारतातील एकमेव मंदिर असल्याचे गावकर्यांकडून कळाले.तसेच अंबड येथील बारव देखील पाहण्यासारखे आहे. हे तिन्ही ठिकाणे एका दिवसात पाहून होतात.
संदर्भग्रंथ :
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयर
२) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४) श्री विनीत दाते, तेजस्विनी आफळे ,हृषीकेश पालोदकर यांचे लिखाण
५) श्री. विशाल टकले यांनी पुरवलेली माहिती
६) https://rohilagad.site123.me/ हि वेबसाईट
७) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
१) औरंगाबाद जिल्हा गॅझेटीयर
२) www.trekshitiz.com हि वेबसाईट
३) www.durgbharari.in हि वेबसाईट
४) श्री विनीत दाते, तेजस्विनी आफळे ,हृषीकेश पालोदकर यांचे लिखाण
५) श्री. विशाल टकले यांनी पुरवलेली माहिती
६) https://rohilagad.site123.me/ हि वेबसाईट
७) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
लेखन सौजन्य-
फोटो सौजन्य- श्री. विनीत दाते
गोंधणपूरची गढीची.
| रोहिलगड |
सुरुवात होती जालना जिल्ह्यातल्या रोहिलगडपासून. विनीत दाते, प्रसाद आणि नेहा परदेशी, भूषण नाडकर्णी, केतन मावळे आणि सोबत मी असे ६ जण दिमतीला टाटा सुमो घेऊन २१ तारखेला शुक्रवारी रात्री निघालो. रोहिलगड हा किल्ला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रोहिलगड गावाजवळच्या टेकडीवर आहे. रोहिलगड गावातून जालन्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर गावापासून जवळच “फिरंगीमाता मंदिर” आहे. ह्या देवळाच्या पलीकडेच टेकडीवर हा किल्ला आहे. देवळापासून किल्ल्यावर जायला १५-२० मिनिटं पुरतात. ह्या किल्ल्याचा माथा बऱ्यापैकी सपाट असून त्याचा आकार साधारणपणे लंबुळक्या बदामाच्या आकाराचा आहे. फिरंगीमाता मंदिरापासून निघाल्यावर आपण ह्या किल्ल्याच्या बदामाच्या खालच्या टोकाला पोचतो. इथून खाली रोहिलगड गांव तर डावीकडे लागुनच एक किल्ल्याच्याच उंचीचा पण आकाराने जास्त पसरलेला "पालखा" नावाचा डोंगर दिसतो.
इथून डाव्या हाताने कडे-कडेने चालत गेल्यास एका बाजूला तटबंदीचे काही अवशेष दिसतात तर इथेच गडाच्या मध्यभागी जमिनीच्या आतमध्ये दहा एक खांब असलेले बाहेरून लहान वाटणारे पण प्रचंड मोठे असे टाके आहे. यातील काही खांब अखंड दिसतात तर काही अगदीच तोकडे दिसतात, कारण हे टाके समोरून आतमध्ये उतरत्या छपराचे असून आतील बाजूस मातीने भरत गेलेले आहे. ह्या टाक्याच्या जवळच आणखी एक बुजत गेलेले टाके आहे. इथून पुढे गडाच्या पूर्वेकडील टोकाकडे जुन्या वाड्याचे काही अवशेष दिसतात. मागे फिरून ध्वज असलेल्या टोकाकडे जाताना लगेचच एक फुटके दगडी रांजण दिसते. गडाच्या उजवीकडे खाली उतरल्यावर पूर्वाभिमुख असे अजून एक मोठे टाके दगडात खोदलेले आहे. हेही टाके मोठे असून ह्यात एक तुटका खांब दिसतो तर प्रवेशालाच ३ पूर्ण खांब आहेत.
![]() |
| गडावरील टाकी |
इथून परत वर येऊन ध्वज असलेल्या गडाच्या सर्वोच्च टोकाकडे जायचे. इथेही काही जुन्या वास्तूचे अवशेष दिसतात तर काही जुनेच दगड गावकऱ्यांनी तटबंदीसारखे रचून ठेवलेले आहेत. आता ह्याच टोकावरून गडाच्या खाली उतरायचे. सपाटीवर आल्यावर पुन्हा पायथ्याच्या मंदिराच्या दिशेने चालत जाताना डावीकडे गडाच्या डोंगरातच दक्षिणाभिमुख म्हणजे गावाच्या दिशेने तोंड करून १०-१२ खांबी गुहा खोदलेली आहे. ह्यात बरोब्बर मध्यभागी मोठा कोनाडा असून त्यात दगडाला शेंदूर फसलेला आहे. ह्या गुहेचे मूळ प्रवेशद्वार मात्र जमिनीच्या पातळीला नसून अगदी गुहेच्या तोंडाजवळ मध्यभागी खाली उतरायला जागा केलेली आहे आणि त्यातून डावीकडे वळून परत पायऱ्या चढून गुहा-मंडपात यावे अशी सोय आहे. गुहेच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा असून ती बऱ्यापैकी बुजलेली आहे. त्यात साळींदर प्राण्याचा वावर असल्याने शक्यतो आतमध्ये जाऊ नये. संपूर्ण गडावर कोणत्याही टाक्यांत पाणी नाही.
![]() |
| कातळकोरीव गुहा |
इथे गडफेरी पूर्ण होते. गडावर जाऊन सगळे अवशेष निवांत पाहून २ तासांत पायथ्याला पोचता येते. गडाच्या जवळ आणखी एक मोठा पसरलेला "पालखा" जोड-डोंगर असून त्यातही गुहा/लेणी आहेत. वेळ असल्यास जरूर पाहून घ्याव्यात.
ह्या गावातले विशाल टकले आणि त्याचे काही मित्र यांनी गडावर साफसफाई केली आहे. हा गड छोटेखानी असला तरी ह्यावरची टाकी आणि गुहा मात्र अतिशय सुंदर आहेत.
“रोहिलागड” नावाचा किल्ला औरंगाबाद जवळ तासाभराच्या अंतरावर आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. अंबड तालुक्यात मोडणारा रोहिलागड औरंगाबादच्या एकदम जवळ आहे. लोकांमध्ये अपरिचित हा किल्ला स्वतःच्या इतिहासाबाबत पण मूक आहे. त्याच कारणाने ह्या किल्ल्याची दुर्ग व वारसा संस्था, औरंगाबाद मार्फत भटकंती आयोजित करण्यात आली. ह्यानिमित्ताने जी काही माहिती आणि परिस्थितीसमोर आली ती आपल्यासमोर सादर करीत आहोत.
भौगोलिक स्थान :औरंगाबादच्या दोन्ही बाजूंनी डोंगररांग पूर्व पश्चिम जाते. छोट्या मध्यम आकाराची ही रांग सोपी जरी वाटत असली तरी मुरमाड मातीने आणि खुरट्या काटेरी झाडांनी चढायला कठीण असते.औरंगाबादच्या सभोवताली असणारे सर्व किल्ले बहुदा अश्याच स्वरूपाच्या डोंगरावर वसलेले आहेत.
किल्ला किती प्राचीन असावा: किल्ला अत्यंत पुरातन असवा. निदान तो देवगिरी राज्याची भरभराट होण्या आधीचा किंवा सोबतचा नक्कीच असावा. सातवाहन काळातील असण्याची शक्यता आहे हे किल्ल्यावरील लेण्यांमुळे लक्षात येते. किल्ल्याचे प्राचीन नाव दुसरे असावे. रोहिला गड हे नाव रोहिले लोकांनी किल्ला हस्तगत केल्यापासून पडले असावे. किल्ला लहुगड नांद्रा सारखा वाटतो.
किल्ल्याचा वापर: हा किल्ला मुख्यत्वेकरून चौकी म्हणून वापरात असावा असं दिसतं. पैठण आणि अंबड या बाजारपेठच्या मधील ठिकाण असल्याने त्याला महत्व असेल. गावात सापडणार्या पुरातन मंदिराचे अवशेष पाहून गाव पण बरेच जुने असेल असं दिसतं. तसेच गडावर असलेला दगडी रांजण कर गोळा करण्यासाठी असू शकतो. असाच रांजण नाणे घाटात देखील पाहायला मिळतो. दुसरी शक्यता अशी कि किल्ला देवगिरीची संरक्षक फळीतला किल्ला म्हणून असू शकतो.
किल्ल्यावरील उपलब्ध अवशेष: किल्ला म्हणून खूप कमी अवशेष पहावयास मिळतात. तटबंदी तर केवळ सात आठ फुटाचीच उरली आहे. गडावर एक अपूर्ण लेणी व २ मोठे पाण्यासाठी कोरलेले टाके आहेत. गडाच्या पूर्व दिशेला बुरुजाचा भाग शिल्लक आहे. या व्यतिरिक्त गडावर कुठलेही अवशेष उपलब्ध नाहीत. गडावरील अनेक अवशेष आसपासच्या लोकांनी घराच्या कामासाठी वापरले असं गावकर्यांकडून माहिती मिळाली.
रोहिले कोण होते आणि कुठून आले: १६ आणि १७ व्या शतकात अफगाण प्रांतातील अनेक पश्तूनी पठाण टोळ्या औरंगजेबाने राजपूतांशी लढायला वापरल्या आणि त्यानंतर या पश्तुनी प्रांतातील लोकांचा भारतात प्रवेश झाला व त्यांची ओळख“रोहिले” म्हणून झाली. विविध लढायात त्यांचा वापर केला गेला. या पठानांचा रोहिलखंड हा उत्तरप्रदेशात स्वतंत्र भाग निर्माण केला.१७६१ मधील पानिपतच्या लढाईत रोहिले मराठ्यांच्या विरुद्ध लढले आणि त्याचा बदला नंतर शूर महादजी शिंदे यांनी रोहिलखंड लुटून आणि रोहिल्यांना लढाईत हरवून घेतला. “रोहिले” हे फक्त पठाण नसून राजपूत पण आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी "रोहिले" लोक आजही राहतात.
कसे आणि कधी जावे:
उन्हाळा सोडल्यास कधीही रोहिला गड पाहण्यासारखा आहे. गड आणि गाव पाहायला तीन तास पुरतात. औरंगाबाद बीड रोडवर अडूळ नंतर एक रस्ता अंबड साठी वळतो. त्याच रस्त्यावर रोहिलागड आहे. तसेच जालनावरुन येताना अंबड मार्गे येत येते.
आपणास या गडाबद्दल अजून काही माहिती असल्यास अथवा या माहितीत सुधारणा सुचवाव्या वाटल्यास आम्हाला ८९९९८६८४०१ या क्रमांकावर संपर्क करावा.
हा लेख दुर्ग व वारसा संवर्धन आणि संशोधन संस्था, औरंगाबाद साठी प्रकाशित करण्यात आला आहे. .
--------
एक दुर्लक्षित गड रोहिला गड पर्यटन करायला सर्वांना आवडतं तसा तो सर्वांचा आवडता छंदच झाला आहे प्रत्येक जण आपापल्या आवडी नुसार पर्यटन स्थळांची निवड करतो परंतु ऐतिहासिक वास्तू वस्तू यांच्या पर्यटनातून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो काही वास्तूची निर्मिती अफलातून झालेली दिसते आपल्या पूर्वजांनी घडवलेल्या इतिहासाचे दर्शन आपल्याला या वास्तू वस्तू पाहिल्याने होते कालौघात नष्ट होत चाललेल्या या वास्तूचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे हा वारसा येणाऱ्या पिढीला पाहता आला पाहिजे त्याचा अभ्यास करता आला पाहिजे प्रत्येक गावाला एक इतिहास असतो तो शोधला तर सापडतो आपल्या परिसरात अशा काही ऐतिहासिक वास्तू,वस्तू असतात कि ज्या पासून सर्वजण अनभिज्ञ असतात कदाचित इतिहासानेही त्याची दखल घेतलेली नसते अशा ज्ञात अज्ञात इतिहासाचा शोध घेऊन तो प्रकाशात आणणे आवश्यक आहे गेल्या वीस वर्षांपासून आम्ही अनेक किल्ले समाध्या वाडे लेण्या इ ऐतिहासिक वास्तू पाहिल्या त्याचा अभ्यास केला अशाच एका दिवाळीच्या सुट्ट्यात गावाकडे असतांना मित्राबरोबर ऐतिहासिक गोष्टीवर गप्पा गोष्टी करताना लक्षात आलं कि आपण आपल्या भोवतालचा इतिहास कधीच जाणून घेतला नाही मग आठवलं शेजारच्या गावात बाजाराच्या दिवशी जायचो त्या गावाशेजारील डोंगरात एक लेणी आहे ती दुरून पाहायचो त्यावर चर्चा सुरू झाली आणि मग काय उद्या तेथे प्रत्येक्ष जायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी मित्रांसह त्या गावात गेलो ते गाव रोहिलागड ता अंबड जि जालना औरंगाबाद पासून ४५ किमी अंतर असून औरंगाबाद ते बीड हायवे पासून १० कि मी आत मध्ये आहे या गावात एक कॉलेजचा मित्र भेटला हे त्याचे मूळ गाव होते त्याच्या कडून थोडी माहिती घेतली त्याने एक वाटाड्या सोबत दिला त्याला घेऊन निघालो गावाला लागूनच असलेल्या डोंगरावर चढायला सुरुवात झाली डोंगराची उंची बेताचीच असून तो आकाराने लहान आहे अर्धे अंतर चढून पार केले थोडे माळरान लागले त्यावर पिकं डोलत होती समोरच एक मोठी खडकात कोरलेली लेणी दिसली तिच्या प्रवेश द्वारा समोर उंच उंच झाडे झुडपे उगवलेली होती त्यातून वाट काढत आम्ही लेणीत गेलो लेणी आकाराने बरीच मोठी असून ती अकरा स्तंभावर उभी आहे सर्व स्तंभ सारख्याच आकाराचे असून तळात ते चौकोनी मध्येभागी षट्कोनी तर वरचा भाग गोलाकार कोरलेला आहे सर्व स्तंभ आडवे उभे एका रेषेत दिसतात लेणीत कुठेच मूर्ती लेख किंवा इतर नक्षीकाम केलेले नाही लेणीत एका बाजूच्या भिंतीत तीन लहान मोठ्या आकाराच्या देवळ्या कोरलेल्या असून एका लहान देवळीत मागच्या बाजूस मूर्ती सारखा आकार असलेल्या ठिकाणी सेंदूर लावलेला आहे स्थानिक लोक याची मारुती म्हणून पूजा करतात लेणीच्या एका बाजूला तळामध्ये एक आयात आकारा चा कोरीव बोगदा दिसतो असे सांगतात की हा एक पायऱ्या असलेला भुयारी मार्ग आहे तो आज पूर्ण पने बुजून टाकलेला आहे याबाबतीत एक अख्यायिका ऐकायला मिळाली ती अशी एका मेंढपाळाच्या सर्व मेंढ्या या भुयारात गेल्या त्यातील एक मेंढी दौलताबाद किल्ल्यात निघाली होती असे सांगतात या लेणीचे काम अर्धवट झालेले दिसते त्याच्या अनेक खाणा खुणा आतमध्ये आहेत लेणी ज्या खडकात खोदली तो ठिसूळ आहे असे दिसते लेणीतील काही स्तंभ तुटलेले दिसतात लेणी बघून झाल्यावर डोंगराच्या माथ्या जवळ आलो एक तटबंदी दिसली तीचे चिरे घडीव होते परंतु ठिसूळ दगडाचे दिसले बांधकामासाठी चुना वापरलेला दिसतो या तट भिंतीपासून जवळच ऐन माथ्यावर एक मोठा खड्डा दिसला हे काय असावे म्हणून ते पाहण्यासाठी जवळ गेलो तर त्यात मोठं मोठी झाडे झुडपे उगवलेली दिसली त्यामुळे नीट दिसेना मग वाटाड्याने सांगितले तये भुयार आहे आम्ही खाली उतरण्यासाठी थोडा रस्ता तयार करून कसेतरी आत उतरलो एका बाजूला अरुंद रस्ता दिसला आत डोकावून पाहिलं तर स्तंभ असलेलं भुयार दिसलं माणसाला सहज चालता येईल एवढी उंची भरपूर रुंद आकार असून लांबी खूप असावी असे दिसते त्याचे स्तंभ गोलाकार असून ते ओबड धोबीड कोरलेले आहेत हा एक प्रकारचा तळ मजला वाटला बॅटरी नसल्यामुळे आम्ही आत जाण्याचे धाडस केले नाही हे भुयार किती लांब आहे हे कुणाला सांगता आले नाही वर आल्यावर बाजूलाच एक मोठे खडका तील तळे दिसले त्यात पाणी होते यातील दगडांचा वापर बांध कामासाठी केला असावा डोंगर कड्याच्या बाजूला तट भिंतीला लागून दोन उंच टेकाड दिसली त्या पैकी एका ठिकाणी खोदकाम केलेले दिसले ते एका घराचे अवशेष असून त्याच्या भिंती रुंद आहेत त्या दगडी फाडी मध्ये चिखल मातीत बांधलेल्या आहेत असे दिसले याच घराच्या मागील बाजूने खाली उतरून गेल्यास एक लेणी दिसते तिच्या प्रवेशद्वारा समोर झाडे झुडपे असल्यामुळे आत गेलो नाही येथे ही एक भुयार आहे असे सांगतात एका मोकळ्या जागी अखंड दगडात कोरलेला गोल आकाराचा अगदी माठा सारखा दिसणारा दगडी रांजण आहे तो ताळामध्ये फुटलेला दिसतो बाजूला एक चौकोनी आकाराच्या प्रशस्त वाड्याच्या भिंतीचा पाया दिसतो आजू बाजूला अनेक छोट्या छोट्या घरांच्या पाया चे आवशेस दिसतात भाजलेल्या विटांचे ही अवशेष येथे दिसतात या डोंगराला चोहो बाजूने तटबंदी होती असे दिसते तिचा पाय दगडांनी भरलेला दिसतो म्हणजे चोहो बाजूनी मजबूत तट बंदी होती हे यावरून दिसते ती दगडी चिरे चिखल मातीत बांधली असावी डोंगराच्या पश्चिमेस एका खाली एक असे तीन टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर पांढरी मातीचे थर व ओबड धोबड दगड दिसतात येथून डोंगरावर चढणे अत्यंत सोपे आहे म्हणून येथे दगड मातीत बांधलेला बुरुज असावा त्याच्या पायाचे अवशेष दिसतात स्थानिक लोक असे सांगतात की येथे टेहाळणी दुरुज होता या गावातील लोकांनी या डोंगरावरील दगडी चिरे खाली आणून घरांची जोती बांधली असे लोक सांगतात तर दुसरे असे की या गावात पूर्वी रोहिले लोक राहत होते म्हणून त्यास रोहिलागड नाव पडले असेही सांगितले जाते या डोंगराच्या आजू बाजूला अनेक लहान मोठया टेकड्या आहेत थोड्याच अंतरावर जांबुवंत गड आहे येथे जांबुवंतांचे मंदिर आहे मी या ठिकाणा विषयी अधिक माहिती मिळवण्या साठी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या कार्या लयात गेलो मी जे पाहिलं ते त्यांना सांगितलं त्यांनाही या विषयी काही माहिती सांगता आली नाही मग त्यांनी जुने औरंगाबाद जिल्हा ग्याझेटिअर काढले त्यातील रोहिलागड गावाच्या नोंदी नुसार जालन्याच्या डोंगर रांगेतील एका डोंगरात लेणी व किल्ल्याचे अवशेष दिसतात एवढीच नोंद मिळाली एकंदरीत सर्व निरीक्षणावरून असे वाटते की या गावात कोणत्यातरी देवतेचे दगडी घडीव चिऱ्याचे प्राचीन मंदिर असावे जे नष्ट झाले आहे डोगरावरावरील किल्ल्याच्या अवशेषां वरून व रचने वरून वाटते की येथे गढीवजा किल्ला असावा त्याचे बांधकाम मध्ययुगीन काळात झाले असावे असे प्रथम दर्शी दिसते दोन्ही लेण्यातीळ भुयारी मार्ग व गडाच्या माळराणा वरील तळातील भुयारी मार्ग हे एकमेकांना जोडलेले असावे असा अंदाज आहे त्याचा वापर संकट कालीन परिस्थिती त केला जात असावा अशा या दुर्लक्षित ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू कालौघात नष्ट होत आहेत या वास्तू इतिहासाच्या खऱ्या अर्थाने साक्षीदार आहेत वास्तू पुन्हा निर्माण होणे कदापि शक्य नाही किमान त्या आहे त्या स्थितीत टिकल्या पाहिजेत त्याच जतन झालं पाहिजे हि अपेक्षा आहे


































No comments:
Post a Comment