Patnadevi- An unexplored historical place : Part 1
- Temple of Goddess Chandika built in 11th century
- Temple of Mahadeo built in 12th century
- Dhavaltirth waterfall
- Kedarkund waterfall
- Pitalkhora caves
- Sita caves, Nagarjun caves, Shrungar chavadi cave
- Fort Kanhergad
To reach Patnadevi, you will get ST bus from chalisgaon or opt for private jeeps. You can get jeeps at Ghatroad area.
Another way to reach Patnadevi is Pune->Aurangabad->Kannad. From Kannad you need to hire private vehicle to reach Pitalkhora caves. These caves are near to the Kalimath ashram(famous landmark). From Pitalkhora, a well-trodden route descends down to the temple of Patnadevi.
![]() |
| Entrance of Gautala sanctuary |
| Patnadevi temple |
![]() |
| mythological infromation |
| Deep-maal |
![]() |
| Sight seeing information |
![]() |
| You will get information regarding animals,trees and birds present in the sanctuary |
![]() |
| statue of Bhaskaracharya |
![]() |
| Forest walk |
![]() |
| Machan...used to keep watch on wood thieves as well as wild animals |
![]() |
| Dhawaltirth waterfall |
| scipts in the temple |
| Temple |
In the backdrop of Hemadpanthi mahadeo temple , you will find Kanhergad. The route starts besides the temple(keeping temple at right side). Follow the well trodden route and after 3-4 minutes walk, you should get Umbrella covered Samadhi built with cement. Start ascending route till it reached to first cave Nagarjuna cave. It is beautifully carved cave with statue of Bhagvan Mahavir. Continue the route and after 5 minutes you will reach to Sita nhani cave.
| Nagarjun cave |
| Sita nhani cave |
![]() |
| Image source: Google map |
| Rock patch of Kanhergad |
| water tank |
| water tank almost burried |
| Fort entrance...Good condition |
| view of sanctuary from the fort |
Hello Vijayendra, there is guest house near Patnadevi temple. You may stay there. But you need prior permission.
Go early to visit the Patnadevi. Enquire near the guest house about booking. Sanctuary closes at 6.00pm so you need to be ready with the option for staying. Otherwise Chalisgaon would be good option for stay. Only 18Km from Patnadevi.
Unfortunately I do not have contact number of the person who does the guest house booking.
To reach Patnadevi , you need to go to Chalisgaon. From Jalgaon, you will get train/bus. Train will take around 1.25 hrs to reach Chalisgaon. From Chalisgaon, you will get ST bus to reach to Patnadevi.
Probable itinerary:
As you are leaving at 11.00am, it may take around 2.00pm to reach to Patnadevi(considering public transport). You can only see temples their. For waterfalls, you should reach in the morning so that you can spend full day in the sanctuary. Return to Chalisgaon(last bus at 6.00pm). There are lodging facilities ion Chalisgaon. Subhash lodging, Sadanand palace might be good option.It is near Bus stand.
Day 2: You will get Aurangabad bus after every 30 minutes from Chalisgaon. Try to catch up early bus. Ask conductor to stop the bus near Daulatabad fort. Enroute there is Bhadra Maruti, Ellora caves, Grushneshwar Jyotirlinga temple which you can add in your trip.If you wanted to stay for day 2 then go to Aurangabad. I am unaware about good lodging facilities but comparing to Daulatabad, you will definitely get good deal in the city. Aurangabad city is itself has many tourist attractions.
कन्हेरगडाच्या पायथ्याशी असलेले हेमाडपंथी शिवमंदिर कन्हेरगडाच्या पायथ्याशी असलेल्या हेमाडपंथी शिवमंदिराचा सभामंडप कन्हेरगडाच्या पायथ्यालाच हेमाडपंथी महादेवाचे मन मोहुन टाकणारे मंदिर आहे. चारही बाजूंनी असणारी झाडी या मंदिराचे वेगळेपण टिकवुन आहे. मंदिराच्या सभामंडपात नंदीची मुर्ती आहे. मंदिराच्या छ्तावर नक्षी बनवलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस वेगवेगळया मुर्ती कोरलेल्या आहेत. कन्हेरगडाचे प्रवेशद्वार गौताळा अभयारण्याच्या क्षेत्रात येणारा कन्हेरगड गर्द झाडींनी व्यापलेला आहे. कन्हेरगड चढताना नागार्जून कोठडी लेणी, सीता न्हाणी लेणी, शृंगार चावडी लेणी या लेण्या लक्ष वेधुन घेतात. गडाचे प्रवेशद्वार बऱ्यापैकी शाबुत आहे. गडमाथ्यावर वाड्याचा चौथरा, एक कबर , हनुमानाची मूर्ती व एक कोरडं पाण्याचं टाकं आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या आवाहनाला उद्योजक मंगेश चव्हाणांची आर्थिक मदत कण्हेरगडाचा असा आहे इतिहास पायऱ्यांचा घेतला जातोय शोध ! उद्योजक मंगेश चव्हाणांची आर्थिक मदत भास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते. माना वाकडया करून पाहिल्यास दरीच्या कडेवरून जवळच खाली आम्हास लेणीहि दिसत होती पण दरीत उतरायचे असेल तर प्रथमच पंधरावीस फूट उघडया खडकावरून खा्ली उतरणे भाग होते. कोरडया दिवसात तेहि अवघड गेले नसते पण खडक ओला आणि शेवाळलेला होता, आम्ही दोघे आणि आमची गाडी ह्याशिवाय आसपास दोनतीन किमी अंतरात कोणी माणूस नव्हता. पाय घसरून अपघात झाला असता तर आडनिडया जागी अडकलो असतो म्हणून ’य: पलायते स जीवति’ हे वचन स्मरून आम्ही लेण्यापर्यंत जाण्याचे टाळले आणि निराशेने माघारी फिरलो. आमच्या त्या दिवशीच्या योजनेत अजूनहि एक बघण्याची जागा होती आणि तिच्याबद्दल हे पुढील वर्णन आहे. आल्या रस्त्याने तसेच पुढे चाळिसगावकडे निघाले की एक बर्यापैकी मोठा घाट लागतो. घाटाचे जुने वा चालू नाव मला आता स्मरत नाही पण कोठेकोठे त्याला कन्नड ह्या जवळच्याच गावावरून ’कन्नड घाट’ असे म्हटले आहे. ह्या घाटाने सुमारे हजार फूट खाली उतरून चाळिसगावकडे जाऊ लागले म्हणजे चाळिसगावच्या थोडे अलीकडे डाव्या हाताला फुटलेला एक रस्ता दिसतो. तो रस्ता पाटण नावाच्या गावाकडे जातो. ह्या गावात एक भवानीदेवीमंदिर आहे आणि तिला पाटणदेवी म्हणतात असे स्मरते. (२०.३२३९° उ ७४.९८०६° पू) पाटणदेवी मंदिर Google Earth पाटणदेवी मंदिर Google Earth पाटण आज एक खेडेवजा गाव आहे पण एकेकाळी ते जास्ती मोठे आणि भरभराटीचे असावे ह्याचा पुरावा म्हणजे गावात अनेक जागी दिसणारी जुनी भग्न मंदिरे आणि उद्ध्वस्त मूर्ति. पाटण हा ’पत्तन’ चा अपभ्रंश. ह्यावरूनहि असा तर्क करता येतो की आजचे हे कुग्राम एकेकाळी ’पत्तन’ पातळीचे मोठे गाव वा शहर असावे. पाटणदेवीच्या मंदिराचीहि बरीच पडझड झाली आहे तरीहि मंदिर वापरात आहे. पितळखोर्यापासून येथे यायला चारचाकीने आम्हास बराच वळसा पडला होता पण पितळखोर्याच्या दरीतील नाला दरीतून बाहेर पडल्यानंतर ह्या देवळाशेजारूनच जातो आणि दरीतून पायी उतरायचे ठरविल्यास लेण्यांपासून मंदिराचे अंतर फार नाही हेहि लक्षात येते. देवळच्या आसपास भरपूर झाडी आणि गौताळा संरक्षित वन असून मागेच सातमाळ्याची डोंगरांची रांग उभी आहे. मंदिर पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम गेलो होतो कारण ह्या जागी प्रसिद्ध गणिती द्वितीय भास्कराचार्य ह्याचा नातू चंगदेव ह्याने चालविलेली पाठशाळा होती आणि भास्कराचार्याचा सिद्धान्तशिरोमणि हा ग्रंथ आणि भास्कराचार्याच्या काही पूर्वजांचे ग्रंथ ह्यांचे अध्ययन तेथे केले जात असे. ह्या देवळातील एका शिलालेखाचे वाचन डॉ. भाऊ दाजी ह्यांनी केले आणि ते Journal of the Royal Asiatic Society, New Series, Vol. I येथे प्रकाशित केले. तेच वाचन प्रोफ़ेसर कीलहॉर्न ह्यांनी संपादित केले ते Epigraphia Indica, Vol. I येथे पान ३३८ येथे उपलब्ध आहे. ( जिज्ञासूंना हे पुस्तक DLI मध्ये मिळेल.) २६ ओळींच्या ह्या लेखात पहिल्या २१ श्लोकबद्ध संस्कृतमधे आणि उरलेल्या ५ गद्य मराठीमधे आहेत. संस्कृत श्लोकात चंगदेवाची पूर्ण वंशावळ आहे ती अशी: शाण्डिल्यवंशे कविचक्रवर्ती त्रिविक्रमोऽभूत्तनयोऽस्य जात:। यो भोजराजेन कृताभिधानो विद्यापतिर्भास्करभट्टनामा॥ १७. तस्माद्गोविन्दसर्वज्ञो जातो गोविन्दसन्निभः। प्रभाकरः सुतस्तस्मात्प्रभाकर इवापरः॥ १८. तस्मात्मनोरथो जातः सतां पूर्णमनोरथः। श्रीमान्महेश्वराचार्यस्ततोऽजनि कवीश्वरः॥ १९. तत्सूनुः कविवृन्दवन्दितपदः सद्वेदविद्यालता- कन्दः कंसरिपुप्रसादितपदः सर्वज्ञविद्यासदः। यच्छिष्यैः सह कोऽपि नो विवदितुं दक्षो विवादी क्वचि- च्छ्रीमान् भास्करकोविदः समभवत्सत्कीर्तिपुण्यान्वितः॥ २०. लक्ष्मीधराख्योऽखिलसूरिमुख्यो वेदार्थवित्तार्किकचक्रवर्ती। क्रतुक्रियाकाण्डविचारसारविशारदो भास्करनन्दनोऽभूत्॥ २१. सर्वशास्त्रार्थदक्षोऽयमिति मत्वा पुरादतः। जैत्रपालेन यो नीतः कृतश्च विबुधाग्रणीः॥ २२. तस्मात्सुतः सिङ्घणचक्रवर्तिर्दैवज्ञवर्योऽजनि चङ्गदेव:। श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः॥ २३. भास्कररचितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणिप्रमुखाः। तद्वंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात्॥ २४. ही वंशावळ (कविचक्रवर्ती) त्रिविक्रम - (भोजराजाश्रय - विद्यापति) भास्कर - गोविंद - प्रभाकर - मनोरथ - (कवीश्वर) महेश्वर - भास्कर (लीलावती इ.) - (जैत्रपालाश्रय) लक्ष्मीधर - (सिंघणाश्रय) चंगदेव मठकर्ता अशी आहे. ह्या श्लोकांवरून असे दिसते की भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला देवगिरीचा राजा जैत्रपाल ह्याने आपला प्रमुख पंडित म्हणून नेमले होते आणि स्वत: चंगदेव हा जैत्रपालाचा मुलगा सिंघण (सन १२१० - १२३३) ह्याचा ज्योतिषी होता. लेखातीलच अन्य काही माहितीवरून असेहि कळते सिंघणाचा मांडलिक निकुंभवंशीय सोइदेव आणि त्याचा भाऊ हेमाद्रि ह्यांनीहि शके ११२९ (सन १२०७) मध्ये मठाला काही नेमणूक करून दिली होती. पाटणदेवी मंदिर १ पाटणदेवी मंदिर १ अशा रीतीने भास्कराचार्याशी जवळचा संबंध असलेले ते देऊळ आणि तो शिलालेख डोळ्यांनी पाहण्याची आमची तीव्र इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही तेथे गेलो होतो. देऊळ पुष्कळसे भग्नावस्थेत होते आणि अनेक मूर्ति, कोरीव दगड, कलाकुसर कोरलेले अनेक दगड एका बाजूस रचून ठेवलेले होते. पुजार्याने दिलेल्या माहितीनुसार शिलालेखहि त्यांमध्येच होता पण सुरक्षिततेच्या कारणाने पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी तो पुष्कळ खाली आणि तोंड उलटे करून ठेवला होता. त्या कारणाने आम्हांस तो पाहायला मिळाला नाही ह्यामुळे हळहळ वाटली. शिलालेखाला एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखी सुरक्षित जागा मिळेपर्यंत तो आहे तसा टिकून राहो ही इच्छा! पाटणदेवी मंदिर २ पाटणदेवी मंदिर २ लेखाच्या अखेरीस चंगदेवाच्या मठाच्या निर्वाहासाठी लावून दिलेल्या देणग्यांचा तपशील जुन्या मराठीत आहे. कीलहॉर्न ह्यांचे Epigraphia Indica मधील वाचन सदोष वाटते आणि बरेच शब्द निरर्थक वाटतात पण तुळपुळे-फेल्डहाउसकृत जुन्या मराठीच्या कोषाच्या मदतीने मी बराचसा भाग सुधारून लावू शकतो तो पुढे देत आहे. ( शं.गो. तुळपुळे-संपादित ’प्राचीन मराठी कोरीव लेणी’ ह्या ग्रंथात हा लेख निश्चित असेल पण त्याची जालीय प्रत उपलब्ध नाही असे दिसते.) श्रीसोइदेवेन मठाय दत्तं हेमाडिना किंचिदिहापरैश्च। भूम्यादि सर्वं प्रतिपालनीयं भविष्यभूपैर्बहु पुण्य??॥ २५. स्वस्ति श्रीशाके ११२८ प्रभवसंवत्सरे श्रावणमासे पौर्णमास्यां चंद्रग्रहणसमये श्रीसोइदेवेन सर्वजनसंनिधौ हस्तोदकपूर्व्वकं निजगुरुमठाया(?)स्थानं दत्तं॥ तद्यथा॥ सोइदेव हेमाडि आणि काही अन्य अशांनी मठाला दिलेली जमीन इत्यादि पुढील काळातील राजांनी चालू ठेवावी. श्रीशक ११२८ प्रभवसंवत्सर श्रावणपौर्णिमा चंद्रग्रहणसमयी सोइदेवाने सर्व जनांच्या समक्ष हातावरून पाणी सोडून आपल्या गुरूच्या मठास दिले ते असे: इयां पाटणी जे केणें उघटे तेहाचा जो असिआउ जो राउला होता ग्राहकापासी तो मठा दीन्हला॥ ब्राह्मणा जे विकतेयापासी ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दीन्हले॥ ग्राहकापासी दामाचा वीसोवा आसूपाठी नगरे दीन्हला॥ तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि .... (पुढील अक्षरे नीट कळत नाहीत.) (शब्दार्थ: केणे - विक्रीचा माल, उघटणे - विक्रीसाठी मांडणे, असिआउ - शासकीय हिस्सा, उत्पन्न, राउल - देऊळ, विकता - विकणारा, ब्रह्मोत्तर - ब्राह्मणाचा वाटा, वीसोवा - विसावा भाग, आसु - एक प्रकारचे सोन्याचे नाणे, गिद वा गिधवे - एक माप. वाहणे - चालू असणे, मवणे - मोजणे, मापउ/मापाउ - मोजलेले, मापहारी - माप करणारा, सूंक - कर. कामत - मालकाने स्वत:ची अवजारे आणि जनावरे देऊन मोलाने कसवलेले शेत, ) ह्या पाटणात जो माल विक्रीसाठी मांडला असेल त्यातील शासकीय हिश्श्यापैकी देवळांकडे द्यायचा भाग मठाला दिला. विक्रेत्यांनी जो ब्राह्मणांच्या साठी भाग बाजूस काढायचा आहे तो ब्राह्मणांकडून मठाला दिला. प्रति आसु नाण्याच्या व्यवहारात विक्रीचा जो विसावा भाग नगराकडे द्यायचा आहे तो नगराने मठाला दिला. (तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ - ह्या वाक्यांचा स्पष्ट अर्थ कळत नाही.) पहिल्या घाण्याच्या तेलापैकी एक लोटी मठाला दिली. नंतर जितके घाणे होतील त्यांमधून एक एक पळी तेल (मठाला दिले.) जे मोजावयाचे ते मठाच्या मापाने मोजावे. मोजलेल्यापैकी अर्धे मठाचे आणि अर्धे मोजणार्याचे. जमिनीवरील कर आणि जमीन... पाटणदेवी मंदिर ३ पाटणदेवी मंदिर ३ भास्कराचार्यांचे मूळ स्थान कोणते असावे ह्याचा आता विचार करू. त्याविषयी भास्कराचार्य स्वत: सिद्धान्तशिरोमणि - गोलाध्याय येथे म्हणतात: आसीत्सह्यकुलाचलाश्रितपुरे त्रैविद्यविद्वज्जने नानासज्जनधाम्नि विज्जडविडे शाण्डिल्यगोत्रो द्विज:। श्रौतस्मार्तविचारसारचतुरो नि:शेषविद्यानिधि: साधूनामवधिर्महेश्वरकृती दैवज्ञचूडामणि:॥ तज्जस्तच्चरणारविन्दयुगलप्राप्तप्रसाद: सुधी- र्मुग्धोद्बोधकरं विदग्धगणकप्रीतिप्रदं प्रस्फुटम्। एतद्व्यक्तसदुक्तियुक्तिबहुलं हेलावगम्यं विदां सिद्धान्तग्रथनं कुबुद्धिमथनं चक्रे कविर्भास्कर:॥ सारांशाने अर्थ की सह्य पर्वतापाशी वसलेल्या विज्जडविड नावाच्या गावी शाण्डिल्य गोत्रातील महेश्वर दैवज्ञ राहात होता. त्याचा पुत्र भास्कर ह्याने सिद्धान्ताचे ग्रथन केले. हे विज्जडविड नावाचे गाव कोठले ह्याविषयी कोणीच काही निश्चितीने सांगू शकत नाही. बीडपासून बिदर, बिजापूरपर्यंत तर्क करण्यात आले आहेत पण ती गावे ’सह्यकुलाचलाश्रित’ अशी सह्य पर्वतानिकटची नाहीत. भास्कराचार्यांचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला जैत्रपालाने ’ह्या नगरातून’ (पुरादतः) बोलावून नेऊन आपला मुख्य पंडित बनविले असे लक्ष्मीधराचा पुत्र चंगदेव शिलालेखात म्हणतो. ह्याचा अर्थ लक्ष्मीधर पाटणातच राहात होता आणि त्याचा पुत्र चंगदेव हा तर निश्चितच तेथे राहात होता. हे गाव ’सह्यकुलाचलाश्रित’हि आहे ह्यात शंका नाही. शेजारचे चित्र तेच दर्शवीत आहे. भास्कराचार्यांचे अन्य वंशीयहि चाळिसगावच्या आसपास राहात होते ह्याला पुरावा आहे. चाळिसगावच्या उत्तरेस १० मैलांवर बहाळ नावाचे गाव आहे आणि तेथील सारजा देवीमंदिरात शके ११४४ चा एक शिलालेख कोरलेला आहे. डॉ. कीलहॉर्न-संपादित हा शिलालेख Epigraphia Indica Vol. 3 येथे पान ११० येथे उपलब्ध आहे. शिलालेख अनंतदेव नावाच्या व्यक्तीने कोरविला असून हा अनंतदेव सिंघणाच्या पदरी मुख्य दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी म्हणून होता. लेखात अनंतदेवाने आपली जी कुलपरंपरा दिली आहे ती शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर - श्रीपति - गणपति - अनंतदेव अशी आहे. वर दिलेल्या चंगदेवाच्या वंशपरंपरेमध्येहि शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर आहेत आणि तेथून भास्कर - लक्ष्मीधर - चंगदेव अशी परंपरा आहे. ह्यावरून हे उघड आहे की अनंतदेव आणि चंगदेव ह्यांची घराणी चुलत घराणी आहेत आणि भास्कर हा अनंतदेवाचा चुलत आजा दिसतो. ह्यावरून असे म्हणता येते की विज्जडविड अथवा विज्जडविडपत्तन ह्या गावी भास्कराचार्यांचा जन्म आणि निवास झाला. कालौघात विज्जडविडपत्तन ह्या लांबलचक नावातून विज्जडविड गळून पडले आणि पूर्ण विस्मृतीत गेले आणि गावाचे नाव केवळ पत्तन आणि कालौघात पाटण असे ओळखले जाऊ लागले. हे गाव एकेकाळी मोठे असावे असे वर म्हटलेच आहे कारण कुग्रामाला कोणी पाटण असे नाव देणे अशक्य वाटते. भास्कराचार्यांचे वास्तव्य आजच्या पाटणमध्येच होते आणि त्याचे विज्जलविड हे नाव मात्र कालौघात लुप्त झाले आहे असा तर्क सहजशक्य वाटतो. भास्कराचार्यांचे कुटुंब मराठीभाषिक होते त्यातून ओघानेच निघते. अशा रीतीने भास्कराचार्यांचे महाराष्ट्रीयत्व हाहि आपणास एक अभिमानाचा विषय! सुरेख संकलन. ह्या सर्व गोष्टी आम्ही मूळातून वाचायची सुतराम शक्यता नव्हती. सरांशाने मांडलित म्हणून नजरेखालून तरी घालायला मिळताहेत. आभार. . बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि ही बाराव्या शतकातली अस्सल प्राकृत/महाराष्ट्री(किंवा आजच्या मराठीची जी कुणी गंगोत्री असेल ती) वाटते. दहावीचा मराठीचा धडा आठवला:- "नरिंद्रबासां भेंटि अनुसरण" त्यातल्या काही ओळी :- देवाचिया दादुलेपनाचा उबारा न सहावेचि साताहि सागरा | भेणें वोसरोनि राजभरा दीधलि द्वारावती || यादवांच्या पदरिच असलेल्या न्रिंद्राच्या ह्या ओळी आहेत. . . . भास्कराचार्य ह्यांचे वास्तव्य बुलडाण्याला होते असे ऐकले होते. आमच्याकडचे ज्येष्ठ त्यास चूक म्हणताना,भास्कराचार्यांचा चंपावतीनगरीमधील वाडाही दाखवायचे.(चंपावतीनगर = बीड जिल्हा.त्यांचा समजला जाणारा वाडा बीड शहरात चोर गल्लीत अगदि १९८८-१८८९ पर्यंत उभा होता. खरे तर तो वाडा त्या काळात त्यांचा गोठा होता म्हणतात. नंतर मागच्या दोनेकशे वर्षात लोकांनी तिथे वाडा बांधला.) . बुलडाणा, पाटण की बीड? . . . . पाटण बद्दलः- आज् कित्येक आडगावाकडली मानली जाणारी, कोपर्यातली किंवा फार फार तर तालुका पातळीवर भासणारी गावे त्याकाळी इतरांच्या मानाने मोठी होती, पेठ् म्हणून मान्यता पावली होती, तर काही राजधानी म्हणता यावीत अशी होती. इसवीसनापूर्वी प्रबळ मगध सत्तेची मूळ राजधानी राजगृह आज निव्वळ् एक छोटेसे खेडे आहे. जुन्नर आज् फक्त् तालुका असला तरी एकेकाळी ते व्यापारी मार्गावरचे महत्वाचे ठिकाण होते. बंटम् हे दक्षिणेत मोठे बंदर होते.(आज् ह्याचे नावही ऐकू येत् नाही.) कनौज हे सांस्कृतिक् केंद्र नि भोजराजाचे ठिकाण् होते, आज् तो फक्त लहान् तालुका तेवढा दिसतो कानपूरजवळ. बदामी, श्रवणबेळगोळ हे महत्वाचे सत्ताकेंद्र होते. भोकरदन हे छोटेसे खेडेगाव् कुणाला ठाउकही नसेल. पण् इथला कोणे एकेकाळचा शासक, आसपसच्या भूभागावरही वचक् ठेवून् असावा. त्याची "भोगवर्धन्" ही राजधानी असल्याचे उल्लेख लोकांच्या गप्पांत येतात. आज एम् पी मधील मांडूगड हे इवलेसे दिसते, पण् पूर्वी ते त्या भागातील regional headquarter होते माळवा वगैरे भागाचे. आज ही ठिकाणे कुठेच नाहीत. त्यांचे प्रशासकीय, लष्करी महत्वही नाही. एकेकाळचे वैभवी पण आज उजाड पडलेले खंडहर(मराठी??) अशी त्यांची अवस्था आहे. आजचे चेन्नै, कोलकाता, मुंबै इंग्रज येण्यापूर्वी अस्तित्वातच नव्हते असे म्हणण्याइतपत लहान् होते. अगदि दिल्लीचेही महत्व शहाजहानने तिथे राज्धानी पुनः वसवल्यानंतरच आले. तोवर मुघल सत्तेचे केंद्र आग्रा होते. आज वैभवात असणारी ठिकाणे कधी उद्या विस्मरणात् जातील काय? सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय? मानवी शरीराची आधी जशी वाढ होते आणि मग जर्जर् वार्धक्य येते तसेच मानवी वस्ती/ शहरांचे होते काय? माझ्या मते इतिहास काळातील बंटम् बंदर आता बंटवाळ या नावाने ओऴखले जात असावे. भास्कराचार्यांचे गाव कोणते? बुलढाणा, पाटण की बीड? बीडविषयीचा तर्क समजण्याजोगा आहे कारण भास्कराचार्यांनी आपले गाव 'विज्जलविड' असल्याचे लिहून ठेवले आहे. ह्यातील 'विड' हे 'बीड'शी उच्चाराने जुळते असल्याने तेच 'विज्जलविड' असे सकृद्दर्शनी वाटू शकेल. पण अन्य कोठे 'विज्जलविड' म्हणजे 'बीड' असा संदर्भ आहे काय? बीड हे सह्याद्रीच्या निकट आहे असेहि कोणी म्हणू शकत नाही, जे विज्जलविडाचे भास्करकृत वर्णन आहे. ह्या दोन आक्षेपांसमोर केवळ उच्चरणसाम्य विज्जलविडाला बीड करण्यास पुरेसे वाटत नाही, विशेषतः पाटणच्या बाजूने मी वर उल्लेखिलेले दोन स्पष्ट पुरावे आणि पाटण एकेकाळचे भरभराटीचे गाव असावे हा विचार लक्षात घेता. (भास्कराचार्यांचा मुलगा आणि नातू तेथे प्रत्यक्ष राहत होते - पुरादतः - आणि अन्य चुलत घराणेहि जवळच राहात होते.) पाटण हे सह्याद्रीच्या निकट तर आहेच. बुलढाणा ह्या चर्चेत कसा येतो हे कळत नाही - अर्थात् स्थानिक चलनाच्या गोष्टी सोडल्यास. बुलढाण्याच्या बाजूने काही पुरावा आहे काय? बुलढाणहि सह्याद्रीच्या निकट नाही. (अवान्तर - आपल्या प्रतिसादातील 'सुरेख द्वारसमुद्र' ह्याचा संदर्भ समजला नाही.) अरविंद कोल्हटकर. भास्कराचार्यांनी आपले गाव 'विज्जलविड' असल्याचे लिहून ठेवले आहे. विज्जलविड (की विज्जडविड) याची इंटरनेटवर अनेक ठिकाणी उकल कर्नाटकातील विजापूर अशी केली आहे. भास्कराचार्यांचा जन्म विजापूर येथील असे म्हटले आहे. तेथेही सह्याद्रीच्या निकट असा उल्लेख दिसतो. आज वैभवात असणारी ठिकाणे कधी उद्या विस्मरणात् जातील काय? सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय? नक्कीच जातील. शहरे/ राज्ये उदयास का आली आणि अस्तास का गेली याला कारणे नक्कीच असतात. महत्त्वाची कारणे म्हणजे, राज्यसत्तेत बदल, हवामानात आणि पर्यावरणातील बदल, लोकांनी शहराचा केलेला दुरुपयोग (लोकांनी शहराची लावलेली वाट. उदा. मुंबई*) ,सर्वायवल (मराठी गंडलं)साठी असणार्या उपलब्धींमध्ये झालेले उतार या सर्वांवर वस्ती/ शहर/ राज्यांचे उदयास्त अवलंबून असतात. (कदाचित अधिक कारणेही असतील. सध्या डोक्यात येत नाहीत.) मानवी शरीराची आधी जशी वाढ होते आणि मग जर्जर् वार्धक्य येते तसेच मानवी वस्ती/ शहरांचे होते काय? हे त्या शहराच्या अस्तास काय कारणीभूत झाले यावर अवलंबून आहे. शत्रूच्या हल्ल्यात संपूर्ण गावाचे शिरकाण झाले, नगरवासियांना गुलाम म्हणून ताब्यात घेण्यात आले. शहराला आग लावून ते बेचिराख केले असा इतिहास दिसतो. अशा ठिकाणी पुन्हा शहर उभारण्यास लोक धजावत नसावे. जेथे हवामान किंवा पर्यावरणात बदल झाले तेथे लोक स्थलांतर करतात. शहरे ओस पडतात. (उदा. सिंधू संस्कृतीतील शहरे) ओस पडलेल्या शहरांना आगी लावण्यात शत्रूला इंटरेष्ट नसतो पण नैसर्गिक उत्पातात त्यांची पडझड होते. तिसरा प्रकार, जेथे माणसांना स्थलांतर करणे शक्य नसते तेव्हा शहरातील माणसे सर्वायवलसाठी एकमेकांच्या जिवावर उठतात. अगदी, शेवटी माणूस माणसाला खाण्यापर्यंत मजल जाऊ शकते. (असे होणे सध्या कठीण असले तरी असे झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात नमूद आहेत.) अवातरः सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय? हा काय प्रश्न झाला, मनोबा? "गोरे रंगपे ना इतना गुमान कर", "ढलता सूरज धीरे धीरे" वगैरे गाणी ऐक बघू एकदा. सर्व उत्तरे मिळतील. ;-) उत्तम लेख आणि हवीशी वाटणारी नवी माहिती येथे दिल्याबद्दल धन्यवाद. सिंघणाच्या काळातही हेमाडी होते यावरून हेमाड किंवा हेमाद्रि ही यादवांकडील एखादी पदवी/उपाधी तर नसावी? (अर्थातच, ते तत्कालीन प्रचलित नावही असू शकते.) निकुंभवंशीय हेमाड हे स्थापत्त्यशास्त्री हेमाडपंत नसावे कारण हेमाडपंत सिंघणाच्या काळी नसून रामचंद्राच्या वेळेस होते. हे जर खरे मानले तर हेमाडपंती मंदिरे तेव्हा प्रचलित नसावी. पाटणच्या मंदिराचे बांधकाम कसे आहे? तसेच, यादवांची राज्यभाषा कोणती होती? कन्नडला प्राधान्य होते की मराठीला? विचारायचा मुद्दा असा की गावाचे नाव "कन्नड" असे आहे. चंगदेव हे कन्नड कवी असल्याचे वाचले होते. भास्कराचार्यांचा जन्मही कर्नाटकातील असे विकीवर म्हटले आहे. हेमाडपंतांचा जन्मही कर्नाटकातीलच. यावरून कर्नाटकातून येथे येऊन स्थायिक होणारे (राज्याश्रय मिळतो म्हणून) अनेक असावेत. तेव्हा भास्कराचार्य मराठी की कन्नड हे कसे ठरवायचे? भास्कराचार्य मराठी का कन्नड या वादात मला रस नाही. मी कुतूहल म्हणून प्रश्न विचारला आहे. भास्कराचार्य मराठी किंवा कन्नडपैकी कोणीही असले तरी मला त्यांचा अभिमानच वाटतो. यादवांची राजभाषा मराठी होती हे तर प्रसिद्धच आहे. कितीक मराठी कवींना त्यांनी प्रोत्साहन दिले. वेंगीचे चालुक्यांनी तेलुगु, मान्यखेटातील राष्ट्रकूटांनी कन्नड तर देवगिरीच्या यादवांनी मराठीला प्रथम राजाश्रय दिला. आता हे सर्व राजे त्या त्या भाषिक प्रदेशांत स्थानिक भाषेत शिलालेख लिहीत असत, पण त्यांनी प्रामुख्याने आश्रय देऊन वाढवलेल्या भाषा म्हणजे वरती सांगितलेल्याच होत. हा युक्तिवाद व ही माहिती या पुस्तकात दिलेली आहे. दक्षिण आशियातील व्हर्नाक्युलरायझेशनबद्दल बोलताना लेखकाने ही माहिती दिलेली आहे. शिवाय तो शिलालेख ज्या काळातला आहे (इ.स.१२०७) त्या काळात औरंगाबाद वगैरे भागात मराठीचा वरचष्मा नक्कीच होता. (याला काही अंशी आधार आधीच्या पुस्तकाचाच आहे.) बाकी भास्कराचार्य मराठी भाषक होते हा तर्क महाराष्ट्र सारस्वतात मांडलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे हेमाड्पंत ही उपाधी यादव कालापेक्षा बरीच जुनी आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी येथील मधुकेश्वर देवालय हे जखनाचार्य या हेमाड्पंतानी बांधले होते असा संदर्भ मिळतो. मला वाटते की आपण 'हेमाडपन्त' ह्या नावाचा चर्चेत उगीचच अडकून पडत आहोत. 'हेमाड' हे 'हेमाद्रि' ह्याचे मराठी/प्राकृत रूप आहे आणि ते एक नाव आहे. ते कोणालाहि कोठल्याहि प्रदेशात ठेवले जाऊ शकते. कर्नाटकात एक हेमाड सापडला म्हणजे महाराष्ट्रातला कोणी दुसरा हेमाड हा कर्नाटकातून तेथे आला असेल काय किंवा कर्नाटकाशी त्याचा काही संबंध असेल काय ही शंका अनाठायी आहे. जसे शंकर, राम, कृष्ण ही नावे कोठेहि भारतभर दिली जाऊ शकतात तसेच काहीसे. हेमाडपन्ती देऊळबांधणी शैलीचा आरंभक, अभिलषितार्थचिन्तामणि ह्या ग्रंथाचा लेखक हेमाद्रि हा बहुतेक रामदेवराव यादवाचा प्रधान होता. 'हेमाद्रि-हेमाड' हे नाव आता प्रचारात नाही त्यामुळे आपणास त्याचे थोडे आकर्षण आहे इतकेच. पण म्हणून एका हेमाद्रीचा काही विशेष दुसर्यास चिकटेल असे नाही. हेमाडपंती बांधकाम म्हणजे नक्की काय? जिथं जिथं आठेकशे तफजार-बाराशे वर्षापूर्वी सत्तास्थाने होती, राजांचा निवास होता, त्या सर्व ठिकाणी विविध मंदिरे पहायला मिळतात. वर्तमानपत्रातून त्याचे सरसकट वर्णन "अमुक ठिकाणी हेमाडपंती मंदिर आहे" असेच येते. महाराष्त्रात प्रत्येक जुने मंदिर बाय डिफॉल्ट हेमाडपंती असते, त्याच्या शेजारी धबधबा असेल तर ती बायडिफॉल्ट सीता न्हाणी असते, सीता -राम् वगैरें॰ए तिथे वास्तव्य असते, किंवा तिथे डबके/तळे/कुंड/विहीर असेल तर ते मंदिर पांडवकालीन असते , तिथले पाण्याचे कुंड म्हणजे कुंतीला तहान लागली भीमाने बमारलेल्या बुक्कीतून तयार झालेले किंवा अर्जुनाच्या बाणाने तयार झालेले असते. एखाद्या ठिकाणी काही उगवत नसेल तर तो तिथे सीता रमायणच्या शेवटी भूगर्भ प्रवेशित झाल्याचा बाय् डिफॉल्ट परिणाम/शाप असतो. तर अशी हेमाडपंती मंदिरे कुठली? माझ्या औरंगाबादम्धील घरासमोरुन थेट सरळ दक्षिणेकडे चालत गेल्यास तीन एक किलोमीटरवर "सातारा"नावाचे छोटेसे गाव लागते, दोनेकशे च्या वस्तीचे, बीडबायपास च्या शेजारी. तर तिथले खंडोबा मंदिर, पुण्याबाहेर पस्तीसकिलोमीटरवर दिसणारे भुलेश्वर(http://misalpav.com/node/12558,http://www.misalpav.com/node/15601) आणि बीड शहरातील सुप्रसिद्ध, प्राचीन कनकालेश्वर(http://www.misalpav.com/node/4678) हे कनकालेश्वर. तर विचारयचं हेच की "हेमाडपंती म्हणजे काय"? हेमाडपंताच्या आधी किंवा नंतर कुणी काहीच बांधले नाही का? "हेमाडपंती म्हणजे काय" ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे द्यावे असे मला काही माहीत नाही. 'A survey of Hemadpanti temples in Maharashtra' by Omkar Prasad Verma, 1973, Nagpur University असे एक पुस्तक मला जालावर दिसले पण ते केवळ नावाच्या स्वरूपात. त्या पुस्तकात काही निष्चिअ माहिती असेल असे त्याच्या नावावरून वाटते. शाळेत ऐकल्याप्रमाणे आणि तसेच जालावर मिळालेल्या काही त्रोटक उल्लेखांवरून असे वाटते की अशा मंदिरांची वैशिष्टये पुढीलप्रमाणे मानता येतील. ही मंदिरे काळ्या पाषाणाचे मोठे चिरे एकमेकांवर वजनाच्या दडपणाने बसविलेले असतात. त्यांच्या जोडणुकीत चुना वा तत्सम बंधकाचा उपयोग नसतो. (बांधकामाच्या टिकाऊपणाला केवळ वजन पुरेसे पडेल काय?) बांधकामात लाकडाचा उपयोग जवळजवळ नसतो आणि दारे खिडक्याहि अगदी कमीतकमी असतात. मंदिरावर विटा वापरून बांधलेला आणि निमुळता होत गेलेला कंगोरेदार कळस असतो. त्याच्या आधारासाठी त्याच्या खाली एकमेकांशी ४५ अंश कोन करून बसविलेले आणि लहान होत जाणारे लांब चिर्यांचे चौरस असतात. http://mr.upakram.org/node/3478 'मराठा डिच, भास्कर राम इत्यादि' ह्या माझ्या जुन्या धाग्यात वर्णिल्याप्रमाणे वाईजवळील पांडववाडी गावात कोल्हटकर कुलाची एक पेशवेकालीन शाखा राहते. त्या घराण्याच्या एकेकाळी मालकीचे असलेले एक शंकराचे मंदिर जवळच्याच भोगाव ह्या गावात आहे. (तेथेचे शेजारी वामनपंडिताची - यमक्या वामन - समाधि आहे.) त्याचे माझ्या संग्रहातील काही फोटो येथे देत आहे. वर वर्णिलेली हेमाडपंती प्रकाराची लक्षणे त्यांत दिसतात असे वाटते. (चित्रे घालणे सध्या होत नाही असे दिसते. संस्थळ पूर्णपणे चालू झाल्यावर तसे करीन.) ऐतिहासिक क्रमाने बघितले तर महाराष्ट्र व कर्नाटक येथील देवळांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते. चालुक्य शैली - काल 7 वे ते ८ वे शतक - उदा. ऐहोले,पट्टडकल येथील दुर्ग किंवा लाडखान मंदिरे राष्ट्रकूट शैली - काल 9 वे किंवा 10 वे शतक - उदा. विजयनगर येथील हेमकूट टेकडीवरील राष्ट्रकूट मंदिरे होयसला शैली - काल 11वे ते 14वे शतक - उदा. विजयनगर येथील हेमकूट टेकडीवरील होयसला मंदिरे हेमाडपंती शैली -काल 13 ते 14व्या शतकाच्या पुढे - उदाहरण देण्याची गरज वाटत नाही कारण महारष्ट्रातील प्रचलित मंदिरे याच शैलीत बांधलेली आहेत. पाटण हे आजचे खेडेगाव एकेकाळचे मोठे शहर असावे असे जे मी वर उल्लेखिले आहे त्याला काही पुरावे मला मिळाले आहेत. तसेच कन्नड-गौताळा संरक्षित वन-कन्नड/गौताळा घाट इत्यादि नावांचा वर उलेख केला आहे त्यांबाबतहि अधिक माहिती मिळाली आहे. तसेच पितळखोरे लेण्यांविषयीहि ही नवी माहिती आहे. आपल्याला हे ठाऊकच आहे की जुन्या काळातील लेणी तत्कालीन व्यापारी दळणवळणाच्या मार्गांना लागून कोरली जात. आजचे पितळखोरे लेणे मात्र कोठेतरी कोपर्यात पडल्यासारखे वाटते कारण ते औरंगाबादहून चाळिसगावाकडे आणि तसेच उत्तरेकडे जाण्याच्या रस्त्यापासून बरेच आत जवळजवळ निर्मनुष्य भागात आहे. मला अशी शंका आली की ते लेणे नेहमीच असे दुर्लक्षित भागामध्ये नसणार, एकेकाळी तेहि मुख्य रहदारीच्या मार्गावर असणार. ह्या दिशेने शोध घेण्यास लागलो तेव्हा प्रथम Itinerary and directory for Western India: being a collection of routes...अशा लांबलचक नावाच्या आणि कॅ. जॉन क्लून्सलिखित (१२वी नेटिव इन्फ़न्ट्री) ह्या १८२६ साली कलकत्त्यात छापलेल्या पुस्तकाकडे वळलो. हे पुस्तक books.google.com येथे उपलब्ध आहे. पुस्तकाच्या काळात सर्व प्रवास पायी वा घोडा, पालखी असा होत असे आणि ह्या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि आसपासच्या भागातील महत्त्वाच्या स्थळांमध्ये एका जागेहून दुसर्या जागी जातांना वाटेत कोणती गावे, नद्या, घाट इ. लागतात, त्यांची अंतरे किती अशा प्रकारची माहिती दिली आहे. (अशा पुस्तकांना Vade Mecum असे लॅटिन नाव आहे.) त्यांपैकी मार्ग क्र. ५५ (रोमन आकडयात LV) आणि ५६ (LVI) हे अनुक्रमे From DHOOLIA by Mehoonbarra and Gowtulla Ghat to AURAGABAD आणि From DHOOLIA to AURANGABAD, via Mehoonbarra and Untoor असे दोन मार्ग आहेत, ज्यांमध्ये Gowtulla Ghat (म्हणजे गौताला घाट) ह्याचा उल्लेख आहे. मार्ग क्र. ५५ वर जी अनेक स्थाने दाखविली आहेत त्यांपैकी गिरणेच्या उत्तरकाठावरचे मेहुणबारे २०.५६९० उ. ७४.९४४८ पू. (Mehunbarra), हिवरखेडा २०.२९२४ उ. ७५.१३४० पू. (Hewurkherah) आणि हिवरखेडयाच्या लगेच दक्षिणेस असलेले कन्नड गाव मी wikimapia.org येथे पाहू शकलो. मेहुणबारे आणि हिवरखेडा ह्यांच्यामध्ये गौताळा घाट आहे असा उल्लेख आहे आणि तो घाट गाडयांना अशक्य आणि उंटांना अवघड असल्याचे वर्णिले आहे. ह्याचा अर्थ असा की क्लून्सच्या वेळी उत्तरेकडून औरंगाबादकडे येण्याचा एक मार्ग गौताळा घाटातून वर येत होता पण तो अवघड होता. गौताळा घाटाविषयी अजून काही माहिती Historical and descriptive sketch of His Highness the Nizam's ...: Volume 1 ह्या पुस्तकात पान ३८४ वर अशा शब्दात उपलब्ध आहे: "The Ghats between His Highness's territory and the British Province of Khandesh are pierced with numerous passes, all of which are more or less used as trade routes. The principle are the Ajanta Pass already mentioned, the Gaotala or Amba Ghat above Kanad, a very old trade route; at the foot of the ghat are the ruins of the ancient city of Patna. The road over this ghat was once so good that it was practicable for carts. It was reconstructed by the Emperor Aurangzeb during his Deccan campaign and was subsequently repaired by Outram when he was Bhil Agent." ह्या वर्णनात स्पष्ट पाटणचा उल्लेख गौताळा घाटाच्या पायथ्याशी असलेले प्राचीन शहर असा केला आहे. औरंगजेबाच्या काळापर्यंत तो घाट वापरात होता हेहि कळते. क्लून्सच्या वेळी मात्र तो खराब झालेला होता. ह्या घाटाला पुन: चांगले दिवस आलेले दिसतात ते ऊट्रम नावाचा ब्रिटिश अधिकारी ’भिल्ल एजंट’ म्हणून कन्नड गावात नेमला गेला तेव्हा. अजिंठयाच्या आसपासचा सर्व भाग भिल्लांच्या टोळ्यांनी व्यापलेला होता आणि हे भिल्ल ब्रिटिश आणि निझाम दोघांचीहि डोकेदुखी होते. आजहि अजिंठयाच्या आसपासच्या बर्याच छोटया गावांना ’तांडा’ असे उपपद आहे हे ह्या भिल्ल दिवसांचीच आठवण देतात. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कन्नड गावात ’भिल्ल एजन्सी’ स्थापन करून एक ब्रिटिश अधिकारी भिल्ल एजंट म्हणून ठेवला गेला होता आणि त्याच्या हाताखाली काही सैनिक भिल्लांच्या बंदोबस्तासाठी दिले होते. असा एक अधिकारी ऊट्रम ह्याने ह्या घाटाची दुरुस्ती करून घेतली होती असा उल्लेख मिळतो. (ह्या घटना १८३०-४० च्या सुमाराच्या आहेत. एजन्सी १८४०त बंद करण्यात आली.) एजन्सीच्या माहितीसाठी पहा The castes and tribes of H.E.H. the Nizam's dominions: Volume 1 पान ६९. आतापर्यंत चर्चिलेला गौताळा घाट म्हणजे आजच्या दिवसातला औरंगाबाद-चाळिसगाव ह्यांना जोडणारा तथाकथित कन्नड-घाट नव्हे. (मी ह्याच घाटाने खाली उतरलो होतो असे वर लिहिले आहे.) वर उल्लेखिलेल्या ऊट्रमच्या नावावरून ह्या घाटाला ’ऊट्रम घाट’ असे नाव होते. हा नवा गाडीरस्ता १८७० साली तयार करण्यात आला. (पहा: ’The Outram Ghat, 10 miles north of Kanhar, was provided in 1870 with a complete cart road.' Maharashtra State gazetteers, Volume 4 p. 580. 'Outram Ghat' असा शोध घेतल्यास snippet view मध्ये हे पान दिसते. ह्या सर्व विवेचनाचा इत्यर्थ असा की भास्कराचार्यांचे ’विज्जडविड’ गाव कोणते असा प्रश्न पडल्यावर साहजिकच बीड सर्वांच्या पुढे येते, काहींना सांगोवांगीवरून विजापूर आणि बुलढाणाहि सुचतात पण सर्वात चांगला दावा असलेले आणि आज सांदीकोपर्यात पडलेले पाटण खेडे मात्र कोणालाच सुचत नाही. आता मला दिसते की ते एकेकाळी महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले गाव होते आणि ते प्राचीन नगर आहे ही स्मृतीहि १९व्या शतकापर्यंत कोठेकोठे जागी होती. म्हणून मला असे वाटते की हे गाव मूळचे ’विज्जलविडपत्तन’ असे असून कालौघात ’विज्जलविड’ गळून पडून त्याचे साधे पाटण झाले असावे आणि भास्कराचार्यांचे वस्तीचे गाव तेच असावे. कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon)) किल्ल्याची ऊंची : 2165 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ जिल्हा : जळगाव श्रेणी : कठीण चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. हे पुरातन मंदिर शक्तीपीठ असून याचे नाव "वरदहस्त" आहे. चंद्रकोरीच्या आकाराच्या डोंगररांगेच्या मध्ये कोंदणात बसवल्या सारखे हे मंदिर आहे. धवलतीर्थात उगम पावणारी डोंगरी नदी या मंदिराजवळून वाहाते. या डोंगररांगेत धवलतीर्थ, केदारेश्वर, केदारकुंड, पितळखोरे लेणी, हेमाडपंथी महादेव मंदिर, कन्हेरगड अशी पौराणिक व ऎतिहासिक महत्व असलेली ठिकाण आहेत. गौताळा अभयारण्याच्या निसर्गरम्य परीसरात दोन दिवस राहून ही सर्व ठिकाणं पाहाता येतात. पाटणा गावातील हेमाडपंथी मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. हेमाडपंथी मंदिराच्या मागील डोंगरावर नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. लेण्यांचा डोंगर व त्यामागील डोंगरावर कन्हेरगडाचे अवशेष पसरलेले आहेत. कन्हेरगड किल्ला कान्हेरगड या नावानेही ओळखला जातो. इतिहास : पौराणिक कथेनुसार पार्वतीच्या उजव्या हाताचा पंजा मंदिरा मागील डोंगरावर पडल्यामुळे "वरदहस्त" शक्तीपीठ निर्माण झाले.या ठिकाणी गोविंदस्वामी यांनी देवीची तपश्चर्या केली. देवीने प्रसन्न झाल्यावर तीने वर दिला मी स्वयंभू मुर्तीच्या रुपाने प्रकट होईन. त्याप्रमाणे देवीची मुर्ती गोविंदस्वामीना कुंडात मिळाली. त्यांनी तिची स्थापना मंदिरात केली. या गोविंदस्वामींची समाधी मंदिरा समोर आहे. पाटणादेवी जवळ असलेली पितळखोरे लेणी निर्मिती सातवहानांच्या काळात झाली असे मानले जाते. त्यानंतर ५- ६ व्या शतकात वाकटाकांच्या काळात या लेण्यांना पुन्हा उर्जितावथा आली. देवगिरीच्या यादवांच्या काळात हा भाग विज्जलगड या नावाने प्रसिध्द होता. पाटणादेवीचे मंदिर यादवराय खेमचंद्र व गोविंदराज मौर्य यांनी ११२० मध्ये जनतेसाठी खुले केले. शुन्याचा शोध लावणारे महान गणिती भास्कराचार्य यांचा जन्म व वास्तव्य विज्जलगड परीसरात इ.स.१११४ ते इ.स. ११८५ या काळात होते. त्यांचे सिध्दांत शिरोमणी, करण कुतुहल, वासनाभास्य, भास्कर व्यवहार, विवाहपटल, सर्वोतोभद्र यंत्र, वासिष्ठतुल्य असे ग्रंथ प्रसिध्द आहेत. सिध्दांत शिरोमणी ग्रंथातील लिलावती हा गणितावरील खंड प्रसिध्द आहेत पहाण्याची ठिकाणे : कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. पाटणा गावाच्या पुढे रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो. ८ फूट उंच दगडी चौथर्यावर हे पूर्वाभिमुख मंदिर उभे आहे. चौथर्यावर फरसबंदी केलेली आहे. या चौथर्यापसून ६ फूट उंचीवर मंदिर बांधलेल आहे. मंदिर ७५ फूट लांब ,३६ फूट लांब ,१८ फूट उंच आहे. मंदिराचे गर्भगृह, सभामंडप व वर्हांडा असे तीन भाग आहेत. मंदिराच्या सभामंडपात नंदीची मुर्ती आहे. गर्भगृहात शंकराची पिंड आहे. गर्भगृहाच्या पट्टीवर गणपती , सप्तमातृका कोरलेल्या आहेत. मंदिराच्या छ्तावर नक्षी बनवलेली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस वेगवेगळया मुर्ती कोरलेल्या आहेत. महादेव मंदिर पाहून मंदिराच्या बाजूने (मंदिर उजव्या बाजूला ठेऊन) जाणार्या पायवाटेने मंदिराच्या मागे जावे. थोडे अंतर चालल्यावर पायवाट डावीकडे वळावे. पुढे सरळ जाणारी पायवाट सोडून उजवीकडे जाणारी पायवाट पकडावी. येथे सिमेंटमध्ये बांधलेली एक छत्री (समाधी) आहे. ही समाधी ओलांडली की आपण कन्हेरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. मंदिरापासून गड पायथ्याला जाण्यास १० मिनिटे लागतात. कन्हेरगडाचा डोंगर आग्नेय - वायव्य ( South East - North West) पसरलेला आहे. या डोंगरावरील कातळ टोपीखाली नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. ती पाहून गडावर जाण्यासाठी प्रथम डोंगराच्या पायथ्याच्या समाधी पासून डोंगरावर चढणार्या पायवाटेने ५ मिनिटांचा खडा चढ चढून जावे. येथे आपल्याला आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे, (डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला) २ मिनिटे सरळ चालल्यावर उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. या वाटेवर सिमेंटने बांधलेल्या काही पायर्या आहेत. ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर पायवाट उजवीकडे वळते (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला) आपण या वाटेने २ मिनिटात नागार्जून लेण्यांपाशी पोहोचतो. नागार्जून कोठडी लेणी ही जैन लेणी दहाव्या शतकात खोदण्यात आली होती. या लेण्यांच्या बाहेर अर्धवट कोरलेला किर्तीस्तंभ असून स्थानिक लोक त्याला "सतीचा खांब" म्हणून मूल होण्यासाठी नवस बोलतात. त्यामुळे या लेण्यापर्यंत लोकांची वर्दळ असते. नागार्जून लेण्याच्या व्हरांडा २ खांबांवर तोललेला आहे. व्हरांद्याच्या उजव्या बाजूला बाकं असलेली बैठकीची खोली आहे. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर तिर्थंकर कोरलेले आहेत. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन हत्तींची मस्तक कोरलेली आहेत. सभामंडप २ खांबांवर तोललेला आहे. खांबाच्या खाली अंबिकेची मुर्ती आहे. सभामंडपात समोरच्या भिंतीवर भगवान महावीरांची पद्मासनात बसलेली मुर्ती आहे. सोबत गंधर्व, सेविका कोरलेल्या आहेत. गुहेच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर गोमटेश्वराची ४ फूटी मूर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूला ४ तिर्थंकर कोरलेले आहेत. गुहेच्या उजव्या बाजूला वरच्या अंगाला पाण्याच टाक आहे. त्याच्या खालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो. गुहेच्या दर्शनी भागात २ खांब असून गुहेत कोणतीही मुर्ती नाही. सीता न्हाणी लेणी पाहून पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे डाव्या बाजूला २०-२५ फूटी कातळ कडा (रॉक पॅच) दिसतो, तो चढून गेल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. खालच्या पाटणा गावातून येणारी ठळक पायवाट या ठिकाणी येऊन मिळते. पाटणा गावातील लोक याच वाटेने गडावर किंवा पलिकडच्या गावात जातात. या कड्याजवळ आल्याची दुसरी खूण म्हणजे येथून खालच्या जंगलात वन खात्याने बांधलेला वॉच टॉवर उठून दिसतो. प्रथम गडावर न जाता राहीलेले तिसर लेण म्हणजे "शृंगार चावडी लेणी" प्रथम पाहून घ्यावी. त्यासाठी (रॉक पॅच) खालून जाणार्या पायवाटेने डोंगराला वळसा घालुन सरळ चालत जावे. ५ मिनिटात आपण २ डोंगरांमधील घळीत पोहोचतो. या घळीत असलेला ओढा ओलांडून डाव्या बाजूस थोडेसे वर चढून गेल्यावर कातळात कोरलेल्या ४-५ पायर्या लागतात. पायर्या संपल्यावर पाण्याचे टाक व त्यामागिल शृंगार चावडी लेणी दिसतात. ही ब्राम्हणी (हिंदु) लेणी अकराव्या शतकात खोदण्यात आली होती. या लेण्याचा व्हरांडा इंग्रजी "L" आकारात कोरलेला आहे. व्हरांडा ४ सुंदर नक्षीदार खांबांवर तोललेला आहे. व्हरांड्याच्या बाहेरच्या बाजूला अनेक शिल्पपट कोरलेले आहेत. सभामंडपाच्या व्दारपट्टीवर नक्षी कोरलेली आहे. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला दोन फूलं कोरलेली आहेत. सभामंडपात कोणतीही मुर्ती नाही. शृंगार चावडी लेणी पाहून परत रॉक पॅच कडे येऊन २० फूटी कातळकडा चढावा. कातळकडा चढण्यासाठी व्यवस्थित खोबण्या (होल्ड) आहेत. त्यांचा वापर करून काळजी पूर्वक कातळकडा चढून एक वळण घेतल्यावर तटबंदीचे अवशेष दिसू लागतात. तटबंदी ओलांडून आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. माचीवरून उजव्या बाजू्ला त्रिकोणी आकाराचे डोंगराचे शिखर दिसते, तोच कन्हेरगडाचा माथा (बालेकिल्ला) आहे. माचीवर पूर्वेला कातळात जमिनीवर कोरलेले पाण्याच टाक आहे. टाक्याच्या बाजूने चढत जाणार्या वाटेवर डाव्या बाजूला एक कबर पाहायला मिळते. पुढे २ मिनिटात एक ठळक पायवाट आडवी येते. या पायवाटेवर प्रथम उजवीकडे वळावे. थोडे चालत गेल्यावर डाव्या बाजूस २ बुजलेली पाण्याची खांब टाकी दिसतात. या टाक्यांच्या अलिकडे वरच्या बाजूस एक कबर आहे. हे सर्व पाहून मागे फिरावे, डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला ठेवत ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला खाली पाटणादेवीचे मंदिर दिसायला लागते, त्यामागे पितळखोरा लेण्यांचा डोंगर व त्याच्याही मागून डोकावणारा पेडका किल्ल्याचा आयताकृती माथा दिसतो. या पायवाटेने अजून ५ मिनिटे चालल्यावर आपण पश्चिमाभिमुख दरवाजापाशी येतो. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या आत पहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला , खालच्या बाजूस कातळात एक खाच केलेली दिसते, या ठिकाणी किल्ल्याचा पुरातन दरवाजा असावा. दरवाजा पाहून पुन्हा किल्ल्यात प्रवेश करावा. दरवाजा जवळून एक पायवाट किल्ल्याच्या माथ्याकडे जाते. या पायवाटेने किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या कातळ टोपीच्या खाली जाता येते. येथे उजवीकडे वळून (दरवाजाच्या विरुध्द दिशेला) डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत ५ मिनिटे चालल्यावर डाव्या बाजूला वरच्या अंगाला कातळात कोरलेल खांब टाक आहे. ते पाहून ५ मिनिटे चालल्यावर आपण माथ्याच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे उजव्या बाजूला काही पायर्या दिसतात. पायर्या चढुन गेल्यावर तटबंदीचे व उध्वस्त दरवाजाचे अवशेष दिसतात. गडमाथ्यावर वाड्याचा चौथरा, एक कबर , हनुमानाची मूर्ती व एक कोरड पाण्याच टाक आहे. कन्हेरगडावरून दक्षिणेला खाली पाटणादेवीचे मंदिर दिसायला लागते, त्यामागे पितळखोरा लेण्यांचा डोंगर व त्याच्याही मागून डोकावणारा पेडका किल्ल्याचा आयताकृती माथा दिसतो. गडमाथा पाहून पायर्या उतरून पायवाटेने परत न जाता सरळ खाली उतरावे ही वाट बुजल्रेल्या खांब टाक्यांपाशी येते कन्हेरगड लेण्यासह पूर्ण पाहाण्यासाठी २ ते ३ तास लागतात. पोहोचण्याच्या वाटा : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे महत्वाचे शहर रेल्वेने व रस्त्याने सर्व महत्वाच्या शहरांशी जोडलेले आहे. चाळीसगाव पासून १८ किमी अंतरावर पाटणादेवीचे प्रसिध्द मंदिर आहे. पाटणादेवीचे मंदिर व कन्हेरगड गौताळा अभयारण्यात आहे. अभयारण्याचे गेट सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० पर्यंत उघडे असते. चाळीसगावातून सकाळी ६.०० पासून दर अर्ध्या तासाने पाटणादेवीला जाण्यासाठी एसटीची बससेवा आहे. त्याशिवाय चाळीसगावातून पाटणादेवीला जाण्यासाठी ६ आसनी रिक्षापण उपलब्ध आहेत. अभयारण्यापासून पाटणादेवी मंदिरापर्यंत जाणार्या रस्त्यावर अभयारण्याच्या गेटपासून १.५ किमी अंतरावर (पाटणा गावाच्या पुढे) महादेव मंदिर अशी पाटी आहे. या मंदिराच्या मागेच कन्हेरगड आहे. रस्त्यावरून उजव्या बाजूला वळून ५ मिनिटात आपण पूरातन हेमाडपंथी महादेव मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या बाजूने (मंदिर उजव्या बाजूला ठेऊन) जाणार्या पायवाटेने मंदिराच्या मागे जावे. थोडे अंतर चालल्यावर पायवाट डावीकडे वळावे. पुढे सरळ जाणारी पायवाट सोडून उजवीकडे जाणारी पायवाट पकडावी. येथे सिमेंटमध्ये बांधलेली एक छत्री (समाधी) आहे. ही समाधी ओलांडली की आपण कन्हेरगडाच्या पायथ्याशी पोहोचतो. मंदिरापासून गड पायथ्याला जाण्यास १० मिनिटे लागतात. कन्हेरगडाचा डोंगर आग्नेय - वायव्य ( South East - North West) पसरलेला आहे. या डोंगरावरील कातळ टोपीखाली नागार्जून कोठडी, सीता न्हाणी व शृंगार चावडी ही ३ लेणी खोदलेली आहेत. ती पाहून गडावर जाण्यासाठी प्रथम डोंगराच्या पायथ्याच्या समाधी पासून डोंगरावर चढणार्या पायवाटेने ५ मिनिटांचा खडा चढ चढून जावे. येथे आपल्याला आडवी जाणारी पायवाट मिळते. या वाटेवर डाव्या बाजूला वळावे, (डोंगर उजव्या बाजूला व दरी डाव्या बाजूला) २ मिनिटे सरळ चालल्यावर उजव्या बाजूला डोंगरावर चढणारी पायवाट दिसते. या वाटेवर सिमेंटने बांधलेल्या काही पायर्या आहेत. ५ मिनिटांचा खडा चढ चढून गेल्यावर पायवाट उजवीकडे वळते (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला) आपण या वाटेने २ मिनिटात नागार्जून कोठडी लेण्यांपाशी पोहोचतो. नागार्जून कोठडी लेण्यांखालून पायवाटेने सरळ (डोंगर डाव्या बाजूला व दरी उजव्या बाजूला ठेवत) पुढे चालत गेल्यावर २ मिनिटात आपण सीता न्हाणी या लेण्यांपाशी पोहोचतो. सीता न्हाणी लेणी पाहून पायवाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर आपण डोंगराच्या वायव्य (North West) टोकाकडे पोहोचतो. येथे डाव्या बाजूला २०-२५ फूटी कातळ कडा (रॉक पॅच) दिसतो, तो चढून गेल्यावर आपला किल्ल्यावर प्रवेश होतो. खालच्या पाटणा गावातून येणारी ठळक पायवाट या ठिकाणी येऊन मिळते. पाटणा गावातील लोक याच वाटेने गडावर किंवा पलिकडच्या गावात जातात. या कड्याजवळ आल्याची दुसरी खूण म्हणजे येथून खालच्या जंगलात वन खात्याने बांधलेला वॉच टॉवर उठून दिसतो. राहाण्याची सोय गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय : चाळीसगावात जेवणाची सोय आहे. पाण्याची सोय : किल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे. जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्या पासून कण्हेरगडावर जाण्यासाठी १ ते दिड तास लागतो. जाण्यासाठी उत्तम कालावधी : जुलै ते फेब्रुवारी सूचना : रॉक पॅच चढण्या-उतरण्यासाठी ३० फूटी रोप जवळ बाळगावा. पाटणादेवी, एका अतिदुर्गम आणि अपरिचित अश्या किल्ल्याची निवासिनी. पुणे, नगर, नाशिक ही भटक्यांची आवडीची ठिकाणे पण ह्या जिल्ह्याच्या थोडे बाहेर बघितले की आपल्याला खुणाऊ लागतात ते अपरिचित किल्ले आणि त्यावरील विशेष स्थाने. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पासून जवळच असलेल्या गौताळा अभयारण्यात आहे कन्हेरगड किल्ला. दाट जंगल, खळखळून वाहनारी नदी, विविध पक्षी आणि प्राणी हे ह्या अभरण्याचे आकर्षण. ६६० मीटर ऊँचावलेल्या कन्हेरगडाच्या पायथ्याशी आहे पाटणादेवीचे सुप्रसिद्ध व भव्य असे हेमाडपंथी मंदिर. १८ भुजा असलेले पाटणादेवी आपल्या प्रत्येक हातात अस्त्र शस्त्र घेऊन तर आहेच तसेच दानव संहार करत सिंहावर सुद्धा आरूढ़ आहे. पाटणादेवी हे दुर्गेचे अश्या प्रकारतील दुर्मिळ रूप दर्शविते. मंदिरा शेजारील जंगल, पक्ष्यांचे आवाज आणि पाण्याची झुळझुळ मन प्रसन्न करतात. ई.स. ११२८ मधे यादवांचे असलेले मांडलिक हेमाडीदेव निकुंभ ह्यांची पाटणदेवी ही राजधानी आणि राजधानी असल्याची पुरेपुर साक्ष कन्हेरगड हा येथे असलेल्या अवषेशावरुन देतो. ई.स. १३०० मधे येथे फारूकी घराण्याने सत्ता स्थापन केली तर ई.स. १६०० मधे मुघल राजवटित हा किल्ला व प्रदेश गेला. ई.स. १७५२ ते १८१८ पर्यन्त मराठी स्वराज येथे होते आणि ईतर किल्ल्या प्रमाणे १८१८ मधे इंग्रजांनी हा किल्ला जिंकला. किल्ला बघताना आपल्यास बघायला मिळतात ते सीता न्हाणी, नागार्जुन गुंफा, जैन गुंफा, यक्ष यक्षिणी, सप्तमातृका शिल्प, श्रृंगारचौरी लेणी, तटबंदी व ईतर अवशेष. भटक्यांनी वाट वाकडी करून पितळखोरे, कन्हेरगड आणि पाटणादेवीचे मंदिर अवश्य बघावे ~विराग विराग भास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ अरविंद कोल्हटकर August 4, 2012 - 10:53 pm पितळखोरे लेणी Google Earth पितळखोरे लेणी Google Earth चंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते. माना वाकडया करून पाहिल्यास दरीच्या कडेवरून जवळच खाली आम्हास लेणीहि दिसत होती पण दरीत उतरायचे असेल तर प्रथमच पंधरावीस फूट उघडया खडकावरून खा्ली उतरणे भाग होते. कोरडया दिवसात तेहि अवघड गेले नसते पण खडक ओला आणि शेवाळलेला होता, आम्ही दोघे आणि आमची गाडी ह्याशिवाय आसपास दोनतीन किमी अंतरात कोणी माणूस नव्हता. पाय घसरून अपघात झाला असता तर आडनिडया जागी अडकलो असतो म्हणून ’य: पलायते स जीवति’ हे वचन स्मरून आम्ही लेण्यापर्यंत जाण्याचे टाळले आणि निराशेने माघारी फिरलो. आमच्या त्या दिवशीच्या योजनेत अजूनहि एक बघण्याची जागा होती आणि तिच्याबद्दल हे पुढील वर्णन आहे. आल्या रस्त्याने तसेच पुढे चाळिसगावकडे निघाले की एक बर्यापैकी मोठा घाट लागतो. घाटाचे जुने वा चालू नाव मला आता स्मरत नाही पण कोठेकोठे त्याला कन्नड ह्या जवळच्याच गावावरून ’कन्नड घाट’ असे म्हटले आहे. ह्या घाटाने सुमारे हजार फूट खाली उतरून चाळिसगावकडे जाऊ लागले म्हणजे चाळिसगावच्या थोडे अलीकडे डाव्या हाताला फुटलेला एक रस्ता दिसतो. तो रस्ता पाटण नावाच्या गावाकडे जातो. ह्या गावात एक भवानीदेवीमंदिर आहे आणि तिला पाटणदेवी म्हणतात असे स्मरते. (२०.३२३९° उ ७४.९८०६° पू) पाटणदेवी मंदिर Google Earth पाटणदेवी मंदिर Google Earth पाटण आज एक खेडेवजा गाव आहे पण एकेकाळी ते जास्ती मोठे आणि भरभराटीचे असावे ह्याचा पुरावा म्हणजे गावात अनेक जागी दिसणारी जुनी भग्न मंदिरे आणि उद्ध्वस्त मूर्ति. पाटण हा ’पत्तन’ चा अपभ्रंश. ह्यावरूनहि असा तर्क करता येतो की आजचे हे कुग्राम एकेकाळी ’पत्तन’ पातळीचे मोठे गाव वा शहर असावे. पाटणदेवीच्या मंदिराचीहि बरीच पडझड झाली आहे तरीहि मंदिर वापरात आहे. पितळखोर्यापासून येथे यायला चारचाकीने आम्हास बराच वळसा पडला होता पण पितळखोर्याच्या दरीतील नाला दरीतून बाहेर पडल्यानंतर ह्या देवळाशेजारूनच जातो आणि दरीतून पायी उतरायचे ठरविल्यास लेण्यांपासून मंदिराचे अंतर फार नाही हेहि लक्षात येते. देवळच्या आसपास भरपूर झाडी आणि गौताळा संरक्षित वन असून मागेच सातमाळ्याची डोंगरांची रांग उभी आहे. मंदिर पाहण्यासाठी आम्ही मुद्दाम गेलो होतो कारण ह्या जागी प्रसिद्ध गणिती द्वितीय भास्कराचार्य ह्याचा नातू चंगदेव ह्याने चालविलेली पाठशाळा होती आणि भास्कराचार्याचा सिद्धान्तशिरोमणि हा ग्रंथ आणि भास्कराचार्याच्या काही पूर्वजांचे ग्रंथ ह्यांचे अध्ययन तेथे केले जात असे. ह्या देवळातील एका शिलालेखाचे वाचन डॉ. भाऊ दाजी ह्यांनी केले आणि ते Journal of the Royal Asiatic Society, New Series, Vol. I येथे प्रकाशित केले. तेच वाचन प्रोफ़ेसर कीलहॉर्न ह्यांनी संपादित केले ते Epigraphia Indica, Vol. I येथे पान ३३८ येथे उपलब्ध आहे. ( जिज्ञासूंना हे पुस्तक DLI मध्ये मिळेल.) २६ ओळींच्या ह्या लेखात पहिल्या २१ श्लोकबद्ध संस्कृतमधे आणि उरलेल्या ५ गद्य मराठीमधे आहेत. संस्कृत श्लोकात चंगदेवाची पूर्ण वंशावळ आहे ती अशी: शाण्डिल्यवंशे कविचक्रवर्ती त्रिविक्रमोऽभूत्तनयोऽस्य जात:। यो भोजराजेन कृताभिधानो विद्यापतिर्भास्करभट्टनामा॥ १७. तस्माद्गोविन्दसर्वज्ञो जातो गोविन्दसन्निभः। प्रभाकरः सुतस्तस्मात्प्रभाकर इवापरः॥ १८. तस्मात्मनोरथो जातः सतां पूर्णमनोरथः। श्रीमान्महेश्वराचार्यस्ततोऽजनि कवीश्वरः॥ १९. तत्सूनुः कविवृन्दवन्दितपदः सद्वेदविद्यालता- कन्दः कंसरिपुप्रसादितपदः सर्वज्ञविद्यासदः। यच्छिष्यैः सह कोऽपि नो विवदितुं दक्षो विवादी क्वचि- च्छ्रीमान् भास्करकोविदः समभवत्सत्कीर्तिपुण्यान्वितः॥ २०. लक्ष्मीधराख्योऽखिलसूरिमुख्यो वेदार्थवित्तार्किकचक्रवर्ती। क्रतुक्रियाकाण्डविचारसारविशारदो भास्करनन्दनोऽभूत्॥ २१. सर्वशास्त्रार्थदक्षोऽयमिति मत्वा पुरादतः। जैत्रपालेन यो नीतः कृतश्च विबुधाग्रणीः॥ २२. तस्मात्सुतः सिङ्घणचक्रवर्तिर्दैवज्ञवर्योऽजनि चङ्गदेव:। श्रीभास्कराचार्यनिबद्धशास्त्रविस्तारहेतोः कुरुते मठं यः॥ २३. भास्कररचितग्रन्थाः सिद्धान्तशिरोमणिप्रमुखाः। तद्वंश्यकृताश्चान्ये व्याख्येया मन्मठे नियमात्॥ २४. ही वंशावळ (कविचक्रवर्ती) त्रिविक्रम - (भोजराजाश्रय - विद्यापति) भास्कर - गोविंद - प्रभाकर - मनोरथ - (कवीश्वर) महेश्वर - भास्कर (लीलावती इ.) - (जैत्रपालाश्रय) लक्ष्मीधर - (सिंघणाश्रय) चंगदेव मठकर्ता अशी आहे. ह्या श्लोकांवरून असे दिसते की भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला देवगिरीचा राजा जैत्रपाल ह्याने आपला प्रमुख पंडित म्हणून नेमले होते आणि स्वत: चंगदेव हा जैत्रपालाचा मुलगा सिंघण (सन १२१० - १२३३) ह्याचा ज्योतिषी होता. लेखातीलच अन्य काही माहितीवरून असेहि कळते सिंघणाचा मांडलिक निकुंभवंशीय सोइदेव आणि त्याचा भाऊ हेमाद्रि ह्यांनीहि शके ११२९ (सन १२०७) मध्ये मठाला काही नेमणूक करून दिली होती. पाटणदेवी मंदिर १ पाटणदेवी मंदिर १ अशा रीतीने भास्कराचार्याशी जवळचा संबंध असलेले ते देऊळ आणि तो शिलालेख डोळ्यांनी पाहण्याची आमची तीव्र इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही तेथे गेलो होतो. देऊळ पुष्कळसे भग्नावस्थेत होते आणि अनेक मूर्ति, कोरीव दगड, कलाकुसर कोरलेले अनेक दगड एका बाजूस रचून ठेवलेले होते. पुजार्याने दिलेल्या माहितीनुसार शिलालेखहि त्यांमध्येच होता पण सुरक्षिततेच्या कारणाने पुरातत्त्व विभागाच्या लोकांनी तो पुष्कळ खाली आणि तोंड उलटे करून ठेवला होता. त्या कारणाने आम्हांस तो पाहायला मिळाला नाही ह्यामुळे हळहळ वाटली. शिलालेखाला एखाद्या वस्तुसंग्रहालयासारखी सुरक्षित जागा मिळेपर्यंत तो आहे तसा टिकून राहो ही इच्छा! पाटणदेवी मंदिर २ पाटणदेवी मंदिर २ लेखाच्या अखेरीस चंगदेवाच्या मठाच्या निर्वाहासाठी लावून दिलेल्या देणग्यांचा तपशील जुन्या मराठीत आहे. कीलहॉर्न ह्यांचे Epigraphia Indica मधील वाचन सदोष वाटते आणि बरेच शब्द निरर्थक वाटतात पण तुळपुळे-फेल्डहाउसकृत जुन्या मराठीच्या कोषाच्या मदतीने मी बराचसा भाग सुधारून लावू शकतो तो पुढे देत आहे. ( शं.गो. तुळपुळे-संपादित ’प्राचीन मराठी कोरीव लेणी’ ह्या ग्रंथात हा लेख निश्चित असेल पण त्याची जालीय प्रत उपलब्ध नाही असे दिसते.) श्रीसोइदेवेन मठाय दत्तं हेमाडिना किंचिदिहापरैश्च। भूम्यादि सर्वं प्रतिपालनीयं भविष्यभूपैर्बहु पुण्य??॥ २५. स्वस्ति श्रीशाके ११२८ प्रभवसंवत्सरे श्रावणमासे पौर्णमास्यां चंद्रग्रहणसमये श्रीसोइदेवेन सर्वजनसंनिधौ हस्तोदकपूर्व्वकं निजगुरुमठाया(?)स्थानं दत्तं॥ तद्यथा॥ सोइदेव हेमाडि आणि काही अन्य अशांनी मठाला दिलेली जमीन इत्यादि पुढील काळातील राजांनी चालू ठेवावी. श्रीशक ११२८ प्रभवसंवत्सर श्रावणपौर्णिमा चंद्रग्रहणसमयी सोइदेवाने सर्व जनांच्या समक्ष हातावरून पाणी सोडून आपल्या गुरूच्या मठास दिले ते असे: इयां पाटणी जे केणें उघटे तेहाचा जो असिआउ जो राउला होता ग्राहकापासी तो मठा दीन्हला॥ ब्राह्मणा जे विकतेयापासी ब्रह्मोत्तर ते ब्राह्मणी दीन्हले॥ ग्राहकापासी दामाचा वीसोवा आसूपाठी नगरे दीन्हला॥ तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि .... (पुढील अक्षरे नीट कळत नाहीत.) (शब्दार्थ: केणे - विक्रीचा माल, उघटणे - विक्रीसाठी मांडणे, असिआउ - शासकीय हिस्सा, उत्पन्न, राउल - देऊळ, विकता - विकणारा, ब्रह्मोत्तर - ब्राह्मणाचा वाटा, वीसोवा - विसावा भाग, आसु - एक प्रकारचे सोन्याचे नाणे, गिद वा गिधवे - एक माप. वाहणे - चालू असणे, मवणे - मोजणे, मापउ/मापाउ - मोजलेले, मापहारी - माप करणारा, सूंक - कर. कामत - मालकाने स्वत:ची अवजारे आणि जनावरे देऊन मोलाने कसवलेले शेत, ) ह्या पाटणात जो माल विक्रीसाठी मांडला असेल त्यातील शासकीय हिश्श्यापैकी देवळांकडे द्यायचा भाग मठाला दिला. विक्रेत्यांनी जो ब्राह्मणांच्या साठी भाग बाजूस काढायचा आहे तो ब्राह्मणांकडून मठाला दिला. प्रति आसु नाण्याच्या व्यवहारात विक्रीचा जो विसावा भाग नगराकडे द्यायचा आहे तो नगराने मठाला दिला. (तलदा इया बैला सिह(?)॥ बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ - ह्या वाक्यांचा स्पष्ट अर्थ कळत नाही.) पहिल्या घाण्याच्या तेलापैकी एक लोटी मठाला दिली. नंतर जितके घाणे होतील त्यांमधून एक एक पळी तेल (मठाला दिले.) जे मोजावयाचे ते मठाच्या मापाने मोजावे. मोजलेल्यापैकी अर्धे मठाचे आणि अर्धे मोजणार्याचे. जमिनीवरील कर आणि जमीन... पाटणदेवी मंदिर ३ पाटणदेवी मंदिर ३ भास्कराचार्यांचे मूळ स्थान कोणते असावे ह्याचा आता विचार करू. त्याविषयी भास्कराचार्य स्वत: सिद्धान्तशिरोमणि - गोलाध्याय येथे म्हणतात: आसीत्सह्यकुलाचलाश्रितपुरे त्रैविद्यविद्वज्जने नानासज्जनधाम्नि विज्जडविडे शाण्डिल्यगोत्रो द्विज:। श्रौतस्मार्तविचारसारचतुरो नि:शेषविद्यानिधि: साधूनामवधिर्महेश्वरकृती दैवज्ञचूडामणि:॥ तज्जस्तच्चरणारविन्दयुगलप्राप्तप्रसाद: सुधी- र्मुग्धोद्बोधकरं विदग्धगणकप्रीतिप्रदं प्रस्फुटम्। एतद्व्यक्तसदुक्तियुक्तिबहुलं हेलावगम्यं विदां सिद्धान्तग्रथनं कुबुद्धिमथनं चक्रे कविर्भास्कर:॥ सारांशाने अर्थ की सह्य पर्वतापाशी वसलेल्या विज्जडविड नावाच्या गावी शाण्डिल्य गोत्रातील महेश्वर दैवज्ञ राहात होता. त्याचा पुत्र भास्कर ह्याने सिद्धान्ताचे ग्रथन केले. हे विज्जडविड नावाचे गाव कोठले ह्याविषयी कोणीच काही निश्चितीने सांगू शकत नाही. बीडपासून बिदर, बिजापूरपर्यंत तर्क करण्यात आले आहेत पण ती गावे ’सह्यकुलाचलाश्रित’ अशी सह्य पर्वतानिकटची नाहीत. भास्कराचार्यांचा पुत्र लक्ष्मीधर ह्याला जैत्रपालाने ’ह्या नगरातून’ (पुरादतः) बोलावून नेऊन आपला मुख्य पंडित बनविले असे लक्ष्मीधराचा पुत्र चंगदेव शिलालेखात म्हणतो. ह्याचा अर्थ लक्ष्मीधर पाटणातच राहात होता आणि त्याचा पुत्र चंगदेव हा तर निश्चितच तेथे राहात होता. हे गाव ’सह्यकुलाचलाश्रित’हि आहे ह्यात शंका नाही. शेजारचे चित्र तेच दर्शवीत आहे. भास्कराचार्यांचे अन्य वंशीयहि चाळिसगावच्या आसपास राहात होते ह्याला पुरावा आहे. चाळिसगावच्या उत्तरेस १० मैलांवर बहाळ नावाचे गाव आहे आणि तेथील सारजा देवीमंदिरात शके ११४४ चा एक शिलालेख कोरलेला आहे. डॉ. कीलहॉर्न-संपादित हा शिलालेख Epigraphia Indica Vol. 3 येथे पान ११० येथे उपलब्ध आहे. शिलालेख अनंतदेव नावाच्या व्यक्तीने कोरविला असून हा अनंतदेव सिंघणाच्या पदरी मुख्य दैवज्ञ म्हणजे ज्योतिषी म्हणून होता. लेखात अनंतदेवाने आपली जी कुलपरंपरा दिली आहे ती शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर - श्रीपति - गणपति - अनंतदेव अशी आहे. वर दिलेल्या चंगदेवाच्या वंशपरंपरेमध्येहि शाण्डिल्यगोत्री मनोहर - महेश्वर आहेत आणि तेथून भास्कर - लक्ष्मीधर - चंगदेव अशी परंपरा आहे. ह्यावरून हे उघड आहे की अनंतदेव आणि चंगदेव ह्यांची घराणी चुलत घराणी आहेत आणि भास्कर हा अनंतदेवाचा चुलत आजा दिसतो. ह्यावरून असे म्हणता येते की विज्जडविड अथवा विज्जडविडपत्तन ह्या गावी भास्कराचार्यांचा जन्म आणि निवास झाला. कालौघात विज्जडविडपत्तन ह्या लांबलचक नावातून विज्जडविड गळून पडले आणि पूर्ण विस्मृतीत गेले आणि गावाचे नाव केवळ पत्तन आणि कालौघात पाटण असे ओळखले जाऊ लागले. हे गाव एकेकाळी मोठे असावे असे वर म्हटलेच आहे कारण कुग्रामाला कोणी पाटण असे नाव देणे अशक्य वाटते. भास्कराचार्यांचे वास्तव्य आजच्या पाटणमध्येच होते आणि त्याचे विज्जलविड हे नाव मात्र कालौघात लुप्त झाले आहे असा तर्क सहजशक्य वाटतो. भास्कराचार्यांचे कुटुंब मराठीभाषिक होते त्यातून ओघानेच निघते. अशा रीतीने भास्कराचार्यांचे महाराष्ट्रीयत्व हाहि आपणास एक अभिमानाचा विषय! सुरेख संकलन. ह्या सर्व गोष्टी आम्ही मूळातून वाचायची सुतराम शक्यता नव्हती. सरांशाने मांडलित म्हणून नजरेखालून तरी घालायला मिळताहेत. आभार. . बाहीरिला आसूपाठी गिधवे ग्राहकापासी॥ पांच पोफली ग्राहकापासी॥ पहिलेया घाणेया घाणाची लोटि मठा दीन्हली॥ जेती घाणे वाहती तेतीया प्रति पली पली तेला ॥ एव जे मविजे ते मढीचीन मापे मवावे मापाउ मढा अर्ध ॥ अर्ध मापहारी ॥ भूपाचे सूंक । तथा भूमि ही बाराव्या शतकातली अस्सल प्राकृत/महाराष्ट्री(किंवा आजच्या मराठीची जी कुणी गंगोत्री असेल ती) वाटते. दहावीचा मराठीचा धडा आठवला:- "नरिंद्रबासां भेंटि अनुसरण" त्यातल्या काही ओळी :- देवाचिया दादुलेपनाचा उबारा न सहावेचि साताहि सागरा | भेणें वोसरोनि राजभरा दीधलि द्वारावती || यादवांच्या पदरिच असलेल्या न्रिंद्राच्या ह्या ओळी आहेत. . . . भास्कराचार्य ह्यांचे वास्तव्य बुलडाण्याला होते असे ऐकले होते. आमच्याकडचे ज्येष्ठ त्यास चूक म्हणताना,भास्कराचार्यांचा चंपावतीनगरीमधील वाडाही दाखवायचे.(चंपावतीनगर = बीड जिल्हा.त्यांचा समजला जाणारा वाडा बीड शहरात चोर गल्लीत अगदि १९८८-१८८९ पर्यंत उभा होता. खरे तर तो वाडा त्या काळात त्यांचा गोठा होता म्हणतात. नंतर मागच्या दोनेकशे वर्षात लोकांनी तिथे वाडा बांधला.) . बुलडाणा, पाटण की बीड? . . . . पाटण बद्दलः- आज् कित्येक आडगावाकडली मानली जाणारी, कोपर्यातली किंवा फार फार तर तालुका पातळीवर भासणारी गावे त्याकाळी इतरांच्या मानाने मोठी होती, पेठ् म्हणून मान्यता पावली होती, तर काही राजधानी म्हणता यावीत अशी होती. इसवीसनापूर्वी प्रबळ मगध सत्तेची मूळ राजधानी राजगृह आज निव्वळ् एक छोटेसे खेडे आहे. जुन्नर आज् फक्त् तालुका असला तरी एकेकाळी ते व्यापारी मार्गावरचे महत्वाचे ठिकाण होते. बंटम् हे दक्षिणेत मोठे बंदर होते.(आज् ह्याचे नावही ऐकू येत् नाही.) कनौज हे सांस्कृतिक् केंद्र नि भोजराजाचे ठिकाण् होते, आज् तो फक्त लहान् तालुका तेवढा दिसतो कानपूरजवळ. बदामी, श्रवणबेळगोळ हे महत्वाचे सत्ताकेंद्र होते. भोकरदन हे छोटेसे खेडेगाव् कुणाला ठाउकही नसेल. पण् इथला कोणे एकेकाळचा शासक, आसपसच्या भूभागावरही वचक् ठेवून् असावा. त्याची "भोगवर्धन्" ही राजधानी असल्याचे उल्लेख लोकांच्या गप्पांत येतात. आज एम् पी मधील मांडूगड हे इवलेसे दिसते, पण् पूर्वी ते त्या भागातील regional headquarter होते माळवा वगैरे भागाचे. आज ही ठिकाणे कुठेच नाहीत. त्यांचे प्रशासकीय, लष्करी महत्वही नाही. एकेकाळचे वैभवी पण आज उजाड पडलेले खंडहर(मराठी??) अशी त्यांची अवस्था आहे. आजचे चेन्नै, कोलकाता, मुंबै इंग्रज येण्यापूर्वी अस्तित्वातच नव्हते असे म्हणण्याइतपत लहान् होते. अगदि दिल्लीचेही महत्व शहाजहानने तिथे राज्धानी पुनः वसवल्यानंतरच आले. तोवर मुघल सत्तेचे केंद्र आग्रा होते. आज वैभवात असणारी ठिकाणे कधी उद्या विस्मरणात् जातील काय? सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय? मानवी शरीराची आधी जशी वाढ होते आणि मग जर्जर् वार्धक्य येते तसेच मानवी वस्ती/ शहरांचे होते काय? भास्कराचार्यांचे गाव कोणते? बुलढाणा, पाटण की बीड? बीडविषयीचा तर्क समजण्याजोगा आहे कारण भास्कराचार्यांनी आपले गाव 'विज्जलविड' असल्याचे लिहून ठेवले आहे. ह्यातील 'विड' हे 'बीड'शी उच्चाराने जुळते असल्याने तेच 'विज्जलविड' असे सकृद्दर्शनी वाटू शकेल. पण अन्य कोठे 'विज्जलविड' म्हणजे 'बीड' असा संदर्भ आहे काय? बीड हे सह्याद्रीच्या निकट आहे असेहि कोणी म्हणू शकत नाही, जे विज्जलविडाचे भास्करकृत वर्णन आहे. ह्या दोन आक्षेपांसमोर केवळ उच्चरणसाम्य विज्जलविडाला बीड करण्यास पुरेसे वाटत नाही, विशेषतः पाटणच्या बाजूने मी वर उल्लेखिलेले दोन स्पष्ट पुरावे आणि पाटण एकेकाळचे भरभराटीचे गाव असावे हा विचार लक्षात घेता. (भास्कराचार्यांचा मुलगा आणि नातू तेथे प्रत्यक्ष राहत होते - पुरादतः - आणि अन्य चुलत घराणेहि जवळच राहात होते.) पाटण हे सह्याद्रीच्या निकट तर आहेच. बुलढाणा ह्या चर्चेत कसा येतो हे कळत नाही - अर्थात् स्थानिक चलनाच्या गोष्टी सोडल्यास. बुलढाण्याच्या बाजूने काही पुरावा आहे काय? बुलढाणहि सह्याद्रीच्या निकट नाही. (अवान्तर - आपल्या प्रतिसादातील 'सुरेख द्वारसमुद्र' ह्याचा संदर्भ समजला नाही.)
विज्जलविड (की विज्जडविड) याची इंटरनेटवर अनेक ठिकाणी उकल कर्नाटकातील विजापूर अशी केली आहे. भास्कराचार्यांचा जन्म विजापूर येथील असे म्हटले आहे. तेथेही सह्याद्रीच्या निकट असा उल्लेख दिसतो. अरे हो! तसा उल्लेख कोल्हटकरांनी लेखात केला आहेच. मी गाळला होता. आज वैभवात असणारी ठिकाणे कधी उद्या विस्मरणात् जातील काय? सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय? नक्कीच जातील. शहरे/ राज्ये उदयास का आली आणि अस्तास का गेली याला कारणे नक्कीच असतात. महत्त्वाची कारणे म्हणजे, राज्यसत्तेत बदल, हवामानात आणि पर्यावरणातील बदल, लोकांनी शहराचा केलेला दुरुपयोग (लोकांनी शहराची लावलेली वाट. उदा. मुंबई*) ,सर्वायवल (मराठी गंडलं)साठी असणार्या उपलब्धींमध्ये झालेले उतार या सर्वांवर वस्ती/ शहर/ राज्यांचे उदयास्त अवलंबून असतात. (कदाचित अधिक कारणेही असतील. सध्या डोक्यात येत नाहीत.) मानवी शरीराची आधी जशी वाढ होते आणि मग जर्जर् वार्धक्य येते तसेच मानवी वस्ती/ शहरांचे होते काय? हे त्या शहराच्या अस्तास काय कारणीभूत झाले यावर अवलंबून आहे. शत्रूच्या हल्ल्यात संपूर्ण गावाचे शिरकाण झाले, नगरवासियांना गुलाम म्हणून ताब्यात घेण्यात आले. शहराला आग लावून ते बेचिराख केले असा इतिहास दिसतो. अशा ठिकाणी पुन्हा शहर उभारण्यास लोक धजावत नसावे. जेथे हवामान किंवा पर्यावरणात बदल झाले तेथे लोक स्थलांतर करतात. शहरे ओस पडतात. (उदा. सिंधू संस्कृतीतील शहरे) ओस पडलेल्या शहरांना आगी लावण्यात शत्रूला इंटरेष्ट नसतो पण नैसर्गिक उत्पातात त्यांची पडझड होते. तिसरा प्रकार, जेथे माणसांना स्थलांतर करणे शक्य नसते तेव्हा शहरातील माणसे सर्वायवलसाठी एकमेकांच्या जिवावर उठतात. अगदी, शेवटी माणूस माणसाला खाण्यापर्यंत मजल जाऊ शकते. (असे होणे सध्या कठीण असले तरी असे झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात नमूद आहेत.) अवांतरः सौंदर्य आणि सुडौल् बांधा कितीही हाती धरावा म्हटला तरी काही काळाने उतरतोच काय? हा काय प्रश्न झाला, मनोबा? "गोरे रंगपे ना इतना गुमान कर", "ढलता सूरज धीरे धीरे" वगैरे गाणी ऐक बघू एकदा. सर्व उत्तरे मिळतील. ;-) * काल परवाच फिल्म इंडस्ट्रीने मुंबई सोडून जाण्याची धमकी दिल्याचे वाचले होते. एवढी मोठी इंडस्ट्री जर इतरत्र स्थायिक झाली तर शहराला किती मोठा तोटा आहे हे लक्षात घ्यावे. भास्कराचार्यांचा हा उल्लेख त्रोटक रूपाने ह्या पुस्तकात येतो. ते पुस्तक घेतले तेव्हापासून म्हणतोय्, एकदा जावे-कधी योग येईल काय माहिती. पण तुम्ही त्याची प्रत्यक्ष सफर घडवून आणलीत त्याबद्दल तुमचे मानावेत तितके आभार थोडेच आहेत. पुस्तकात असे म्हटले आहे की अगदी शिलालेखाइतका निश्चित पुरावा अन्य कुणा प्राचीन भारतीय गणितीबद्दल सापडल्याचे ऐकिवात नाही. नक्की वाक्य मागाहून चिकटवतो, सध्या स्मरणाने लिहीत आहे. बाकी महाराष्ट्र सारस्वतात "भास्कराचार्य हा महाराष्ट्र भाषा बोलणारा होता" असा उल्लेख जाता जाता आला आहे. सिंघणाच्या काळातही हेमाडी होते यावरून हेमाड किंवा हेमाद्रि ही यादवांकडील एखादी पदवी/उपाधी तर नसावी? (अर्थातच, ते तत्कालीन प्रचलित नावही असू शकते.) निकुंभवंशीय हेमाड हे स्थापत्त्यशास्त्री हेमाडपंत नसावे कारण हेमाडपंत सिंघणाच्या काळी नसून रामचंद्राच्या वेळेस होते. हे जर खरे मानले तर हेमाडपंती मंदिरे तेव्हा प्रचलित नसावी. पाटणच्या मंदिराचे बांधकाम कसे आहे? तसेच, यादवांची राज्यभाषा कोणती होती? कन्नडला प्राधान्य होते की मराठीला? विचारायचा मुद्दा असा की गावाचे नाव "कन्नड" असे आहे. चंगदेव हे कन्नड कवी असल्याचे वाचले होते. भास्कराचार्यांचा जन्मही कर्नाटकातील असे विकीवर म्हटले आहे. हेमाडपंतांचा जन्मही कर्नाटकातीलच. यावरून कर्नाटकातून येथे येऊन स्थायिक होणारे (राज्याश्रय मिळतो म्हणून) अनेक असावेत. तेव्हा भास्कराचार्य मराठी की कन्नड हे कसे ठरवायचे? भास्कराचार्य मराठी का कन्नड या वादात मला रस नाही. मी कुतूहल म्हणून प्रश्न विचारला आहे. भास्कराचार्य मराठी किंवा कन्नडपैकी कोणीही असले तरी मला त्यांचा अभिमानच वाटतो. यादवांची राजभाषा मराठी होती हे तर प्रसिद्धच आहे. कितीक मराठी कवींना त्यांनी प्रोत्साहन दिले. वेंगीचे चालुक्यांनी तेलुगु, मान्यखेटातील राष्ट्रकूटांनी कन्नड तर देवगिरीच्या यादवांनी मराठीला प्रथम राजाश्रय दिला. आता हे सर्व राजे त्या त्या भाषिक प्रदेशांत स्थानिक भाषेत शिलालेख लिहीत असत, पण त्यांनी प्रामुख्याने आश्रय देऊन वाढवलेल्या भाषा म्हणजे वरती सांगितलेल्याच होत. हा युक्तिवाद व ही माहिती या पुस्तकात दिलेली आहे. दक्षिण आशियातील व्हर्नाक्युलरायझेशनबद्दल बोलताना लेखकाने ही माहिती दिलेली आहे. शिवाय तो शिलालेख ज्या काळातला आहे (इ.स.१२०७) त्या काळात औरंगाबाद वगैरे भागात मराठीचा वरचष्मा नक्कीच होता. (याला काही अंशी आधार आधीच्या पुस्तकाचाच आहे.) बाकी भास्कराचार्य मराठी भाषक होते हा तर्क महाराष्ट्र सारस्वतात मांडलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे हेमाड्पंत ही उपाधी यादव कालापेक्षा बरीच जुनी आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील बनवासी येथील मधुकेश्वर देवालय हे जखनाचार्य या हेमाड्पंतानी बांधले होते असा संदर्भ मिळतो. मला वाटते की आपण 'हेमाडपन्त' ह्या नावाचा चर्चेत उगीचच अडकून पडत आहोत. 'हेमाड' हे 'हेमाद्रि' ह्याचे मराठी/प्राकृत रूप आहे आणि ते एक नाव आहे. ते कोणालाहि कोठल्याहि प्रदेशात ठेवले जाऊ शकते. कर्नाटकात एक हेमाड सापडला म्हणजे महाराष्ट्रातला कोणी दुसरा हेमाड हा कर्नाटकातून तेथे आला असेल काय किंवा कर्नाटकाशी त्याचा काही संबंध असेल काय ही शंका अनाठायी आहे. जसे शंकर, राम, कृष्ण ही नावे कोठेहि भारतभर दिली जाऊ शकतात तसेच काहीसे. हेमाडपन्ती देऊळबांधणी शैलीचा आरंभक, अभिलषितार्थचिन्तामणि ह्या ग्रंथाचा लेखक हेमाद्रि हा बहुतेक रामदेवराव यादवाचा प्रधान होता. 'हेमाद्रि-हेमाड' हे नाव आता प्रचारात नाही त्यामुळे आपणास त्याचे थोडे आकर्षण आहे इतकेच. पण म्हणून एका हेमाद्रीचा काही विशेष दुसर्यास चिकटेल असे नाही. हेमाड/ हेमाद्री ही उपाधी असू शकते आणि हेमाडपंत रामचंद्राचे प्रधान होते हे मी वर म्हटले आहेच. तो प्रश्न मला पडलेला नाही किंवा महाराष्ट्रातून कोणी आले म्हणून विशेष अभिमानही नाही आणि ते कर्नाटकातून आलेले नव्हतेच असे सांगण्याइतपत सज्जड पुरावेही नाहीत. मी वरील प्रतिसादात प्रश्न स्पष्ट विचारला आहे असे वाटते. तरीही पुन्हा एकदा - पाटणदेवी मंदिराचे बांधकाम हेमाडपंती शैलीत आहे का? हेमाडपंती बांधकाम म्हणजे नक्की काय? तर अशी हेमाडपंती मंदिरे कुठली? माझ्या औरंगाबादम्धील घरासमोरुन थेट सरळ दक्षिणेकडे चालत गेल्यास तीन एक किलोमीटरवर "सातारा"नावाचे छोटेसे गाव लागते, दोनेकशे च्या वस्तीचे, बीडबायपास च्या शेजारी. तर तिथले खंडोबा मंदिर, पुण्याबाहेर पस्तीसकिलोमीटरवर दिसणारे भुलेश्वर(http://misalpav.com/node/12558,http://www.misalpav.com/node/15601) आणि बीड शहरातील सुप्रसिद्ध, प्राचीन कनकालेश्वर(http://www.misalpav.com/node/4678) हे कनकालेश्वर. "हेमाडपंती म्हणजे काय" ह्या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे द्यावे असे मला काही माहीत नाही. 'A survey of Hemadpanti temples in Maharashtra' by Omkar Prasad Verma, 1973, Nagpur University असे एक पुस्तक मला जालावर दिसले पण ते केवळ नावाच्या स्वरूपात. त्या पुस्तकात काही निष्चिअ माहिती असेल असे त्याच्या नावावरून वाटते. शाळेत ऐकल्याप्रमाणे आणि तसेच जालावर मिळालेल्या काही त्रोटक उल्लेखांवरून असे वाटते की अशा मंदिरांची वैशिष्टये पुढीलप्रमाणे मानता येतील. ही मंदिरे काळ्या पाषाणाचे मोठे चिरे एकमेकांवर वजनाच्या दडपणाने बसविलेले असतात. त्यांच्या जोडणुकीत चुना वा तत्सम बंधकाचा उपयोग नसतो. (बांधकामाच्या टिकाऊपणाला केवळ वजन पुरेसे पडेल काय?) बांधकामात लाकडाचा उपयोग जवळजवळ नसतो आणि दारे खिडक्याहि अगदी कमीतकमी असतात. मंदिरावर विटा वापरून बांधलेला आणि निमुळता होत गेलेला कंगोरेदार कळस असतो. त्याच्या आधारासाठी त्याच्या खाली एकमेकांशी ४५ अंश कोन करून बसविलेले आणि लहान होत जाणारे लांब चिर्यांचे चौरस असतात. http://mr.upakram.org/node/3478 'मराठा डिच, भास्कर राम इत्यादि' ह्या माझ्या जुन्या धाग्यात वर्णिल्याप्रमाणे वाईजवळील पांडववाडी गावात कोल्हटकर कुलाची एक पेशवेकालीन शाखा राहते. त्या घराण्याच्या एकेकाळी मालकीचे असलेले एक शंकराचे मंदिर जवळच्याच भोगाव ह्या गावात आहे. (तेथेचे शेजारी वामनपंडिताची - यमक्या वामन - समाधि आहे.) त्याचे माझ्या संग्रहातील काही फोटो येथे देत आहे. वर वर्णिलेली हेमाडपंती प्रकाराची लक्षणे त्यांत दिसतात असे वाटते. (चित्रे घालणे सध्या होत नाही असे दिसते. संस्थळ पूर्णपणे चालू झाल्यावर तसे करीन.) ऐतिहासिक क्रमाने बघितले तर महाराष्ट्र व कर्नाटक येथील देवळांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते. चालुक्य शैली - काल 7 वे ते ८ वे शतक - उदा. ऐहोले,पट्टडकल येथील दुर्ग किंवा लाडखान मंदिरे पाटण हे आजचे खेडेगाव एकेकाळचे मोठे शहर असावे असे जे मी वर उल्लेखिले आहे त्याला काही पुरावे मला मिळाले आहेत. तसेच कन्नड-गौताळा संरक्षित वन-कन्नड/गौताळा घाट इत्यादि नावांचा वर उलेख केला आहे त्यांबाबतहि अधिक माहिती मिळाली आहे. तसेच पितळखोरे लेण्यांविषयीहि ही नवी माहिती आहे. आपल्याला हे ठाऊकच आहे की जुन्या काळातील लेणी तत्कालीन व्यापारी दळणवळणाच्या मार्गांना लागून कोरली जात. आजचे पितळखोरे लेणे मात्र कोठेतरी कोपर्यात पडल्यासारखे वाटते कारण ते औरंगाबादहून चाळिसगावाकडे आणि तसेच उत्तरेकडे जाण्याच्या रस्त्यापासून बरेच आत जवळजवळ निर्मनुष्य भागात आहे. मला अशी शंका आली की ते लेणे नेहमीच असे दुर्लक्षित भागामध्ये नसणार, एकेकाळी तेहि मुख्य रहदारीच्या मार्गावर असणार. ह्या दिशेने शोध घेण्यास लागलो तेव्हा प्रथम Itinerary and directory for Western India: being a collection of routes...अशा लांबलचक नावाच्या आणि कॅ. जॉन क्लून्सलिखित (१२वी नेटिव इन्फ़न्ट्री) ह्या १८२६ साली कलकत्त्यात छापलेल्या पुस्तकाकडे वळलो. हे पुस्तक books.google.com येथे उपलब्ध आहे. पुस्तकाच्या काळात सर्व प्रवास पायी वा घोडा, पालखी असा होत असे आणि ह्या पुस्तकात महाराष्ट्रातील आणि आसपासच्या भागातील महत्त्वाच्या स्थळांमध्ये एका जागेहून दुसर्या जागी जातांना वाटेत कोणती गावे, नद्या, घाट इ. लागतात, त्यांची अंतरे किती अशा प्रकारची माहिती दिली आहे. (अशा पुस्तकांना Vade Mecum असे लॅटिन नाव आहे.) त्यांपैकी मार्ग क्र. ५५ (रोमन आकडयात LV) आणि ५६ (LVI) हे अनुक्रमे From DHOOLIA by Mehoonbarra and Gowtulla Ghat to AURAGABAD आणि From DHOOLIA to AURANGABAD, via Mehoonbarra and Untoor असे दोन मार्ग आहेत, ज्यांमध्ये Gowtulla Ghat (म्हणजे गौताला घाट) ह्याचा उल्लेख आहे. मार्ग क्र. ५५ वर जी अनेक स्थाने दाखविली आहेत त्यांपैकी गिरणेच्या उत्तरकाठावरचे मेहुणबारे २०.५६९० उ. ७४.९४४८ पू. (Mehunbarra), हिवरखेडा २०.२९२४ उ. ७५.१३४० पू. (Hewurkherah) आणि हिवरखेडयाच्या लगेच दक्षिणेस असलेले कन्नड गाव मी wikimapia.org येथे पाहू शकलो. मेहुणबारे आणि हिवरखेडा ह्यांच्यामध्ये गौताळा घाट आहे असा उल्लेख आहे आणि तो घाट गाडयांना अशक्य आणि उंटांना अवघड असल्याचे वर्णिले आहे. ह्याचा अर्थ असा की क्लून्सच्या वेळी उत्तरेकडून औरंगाबादकडे येण्याचा एक मार्ग गौताळा घाटातून वर येत होता पण तो अवघड होता. गौताळा घाटाविषयी अजून काही माहिती Historical and descriptive sketch of His Highness the Nizam's ...: Volume 1 ह्या पुस्तकात पान ३८४ वर अशा शब्दात उपलब्ध आहे: ह्या घाटाला पुन: चांगले दिवस आलेले दिसतात ते ऊट्रम नावाचा ब्रिटिश अधिकारी ’भिल्ल एजंट’ म्हणून कन्नड गावात नेमला गेला तेव्हा. अजिंठयाच्या आसपासचा सर्व भाग भिल्लांच्या टोळ्यांनी व्यापलेला होता आणि हे भिल्ल ब्रिटिश आणि निझाम दोघांचीहि डोकेदुखी होते. आजहि अजिंठयाच्या आसपासच्या बर्याच छोटया गावांना ’तांडा’ असे उपपद आहे हे ह्या भिल्ल दिवसांचीच आठवण देतात. भिल्लांच्या बंदोबस्तासाठी कन्नड गावात ’भिल्ल एजन्सी’ स्थापन करून एक ब्रिटिश अधिकारी भिल्ल एजंट म्हणून ठेवला गेला होता आणि त्याच्या हाताखाली काही सैनिक भिल्लांच्या बंदोबस्तासाठी दिले होते. असा एक अधिकारी ऊट्रम ह्याने ह्या घाटाची दुरुस्ती करून घेतली होती असा उल्लेख मिळतो. (ह्या घटना १८३०-४० च्या सुमाराच्या आहेत. एजन्सी १८४०त बंद करण्यात आली.) एजन्सीच्या माहितीसाठी पहा The castes and tribes of H.E.H. the Nizam's dominions: Volume 1 पान ६९. आतापर्यंत चर्चिलेला गौताळा घाट म्हणजे आजच्या दिवसातला औरंगाबाद-चाळिसगाव ह्यांना जोडणारा तथाकथित कन्नड-घाट नव्हे. (मी ह्याच घाटाने खाली उतरलो होतो असे वर लिहिले आहे.) वर उल्लेखिलेल्या ऊट्रमच्या नावावरून ह्या घाटाला ’ऊट्रम घाट’ असे नाव होते. हा नवा गाडीरस्ता १८७० साली तयार करण्यात आला. (पहा: ’The Outram Ghat, 10 miles north of Kanhar, was provided in 1870 with a complete cart road.' Maharashtra State gazetteers, Volume 4 p. 580. 'Outram Ghat' असा शोध घेतल्यास snippet view मध्ये हे पान दिसते. ह्या सर्व विवेचनाचा इत्यर्थ असा की भास्कराचार्यांचे ’विज्जडविड’ गाव कोणते असा प्रश्न पडल्यावर साहजिकच बीड सर्वांच्या पुढे येते, काहींना सांगोवांगीवरून विजापूर आणि बुलढाणाहि सुचतात पण सर्वात चांगला दावा असलेले आणि आज सांदीकोपर्यात पडलेले पाटण खेडे मात्र कोणालाच सुचत नाही. आता मला दिसते की ते एकेकाळी महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले गाव होते आणि ते प्राचीन नगर आहे ही स्मृतीहि १९व्या शतकापर्यंत कोठेकोठे जागी होती. म्हणून मला असे वाटते की हे गाव मूळचे ’विज्जलविडपत्तन’ असे असून कालौघात ’विज्जलविड’ गळून पडून त्याचे साधे पाटण झाले असावे आणि भास्कराचार्यांचे वस्तीचे गाव तेच असावे.
आपल्या लेखातील पाटणा देवी व महादेव मंदिर या दोन जागा नुकत्याच पाहण्यात आल्या. खूप छान परिसर आहे. 44 डिग्रीचे रणरणते ऊन असूनही मंदिरांना भेट दिल्याचे सार्थक झाले. पाटणा देवी मंदिराच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या दिपस्तंभांची घडण वेगवेगळी का असावी? एकाला दीपस्तंभ/दीपमाळ म्हणता येईल परंतु दुसऱ्याचा पृष्ठभाग पूर्णपणे सपाट आहे याचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळ्या काळातील असावेत का? या निमित्ताने महादेव मंदिराचे काही फोटो देत आहे.
आडवाटेवरचा स्वातंत्र्य दिन!ओंकार ओक
दिनांक १५ ऑगस्ट २०१५ सकाळचे सहा वाजत आले होते. कन्नड घाटाच्या मागे दूरवर कुठेतरी अंतुर किल्ल्याची पुसटशी झलक दिसत होती आणि त्यामागून तेजोभास्कराची सोनेरी किरणे सारा आसमंत चेतवून टाकत होती. पाटणादेवीच्या भल्यामोठ्या बंद दरवाजासमोर सुमारे पस्तीस मिनिटे आतल्या फॉरेस्ट कर्मचाऱ्याची निद्रिस्त तपश्चर्या भंग करण्याचे अनेक प्रयत्न असफलच ठरत होते. या सगळ्या रहाटगाडग्यात ग्रुपमधल्या काही अनुभवी मंडळींनी आपल्या स्लिपिंग बॅग्ज बाहेर काढून गाडीमध्ये अर्धवट झालेल्या झोपेची थकबाकी पूर्ण करून घेतली. आज कण्हेरगड व पेडका करून कळंकी गावात मुक्काम करायचा होता. अखेर सरकारी नियमाला जागून आपली झोप पूर्ण झाल्यावरच साठीच्या आसपासचा वनविभागाचा एक कर्मचारी डोळे चोळत चोळत बाहेर आला!! काय पायजे? हा प्रश्न अपेक्षित होताच! आम्ही पुण्याहून आलोय. कण्हेरगड किल्ला बघायला. जोशीकाकांशी (पाटणादेवीचे अध्यक्ष) आठ दिवसांपूर्वीच बोलणं झालंय. हा...ते पुण्याचे ओंकार ओक तुम्हीच का??? हो मीच हा. या आत. येन्ट्री करा फक्त. तुमचे गाइड १५ मिनिटात येतील. सगळी फिल्डिंग व्यवस्थित लागल्याची ही पावती होती. अखेर पाटणादेवीच्या गर्द झाडीने भरलेल्या सुरेख रस्त्यावरून आमची गाडी धावू लागली आणि ट्रेकला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झाली होती. दरवर्षीच्या शिरस्त्याला जागून १५ ऑगस्ट या दिवसाचे महत्त्व जपत सह्याद्रीमध्येच आपले स्वातंत्र्य उपभोगायचे आणि एखाद्या आडवाटेच्या आणि भन्नाट घाटवाटेवर किंवा किल्ल्यावर मनसोक्त भटकायचे हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून माणिकपुंज-राजदेहेर ऊर्फ धेरी किल्ला-कण्हेरगड (पाटणादेवी) आणि पेडका या चार भन्नाट आणि अतिशय अनवट अशा किल्ल्यांच्या भटकंतीचा बेत ज्यावेळी शिजला त्याचवेळी गाडी फुल्ल होण्याची चिन्ह दिसू लागली आणि अखेर सतरा जणांच्या टोळक्याने १४ ला रात्रीच पुणे सोडलं आणि औरंगाबाद-कन्नड-शिवापूरमार्गे कण्हेरगड पायथ्याच्या पाटणादेवी गावात आम्ही दाखल झालो. पाटणादेवी या स्थळाला तिथल्या देवीमुळे प्रचंड महत्त्व आहे आणि बाराही महिने भक्तांची रीघ पाटणादेवी गावात लागलेली असते. गावाच्या डोईवर वसलेला कण्हेरगड आणि आजूबाजूचे घनदाट जंगल मात्र गौताळा अभयारण्याच्या प्रदेशात येत असल्याने अतिशय सुरक्षित ठेवले गेलं आहे. पाटणादेवीच्या अध्यक्षांशी आधीच बोलून ठेवल्याने सगळी व्यवस्था चोख लागलेली होती. एक सामान्य समाज हा आहे, की हा कण्हेरगड आणि नाशिक जिल्ह्यातला कण्हेरा किल्ला एकच. पण ते तसे नसून नाशिक जिल्ह्यातला कण्हेरगड हा सातमाळा रांगेत असून पाटणादेवीचा कण्हेरगड जळगाव जिल्ह्यात येतो. त्यामुळे या दोन्ही किल्ल्यांचा नामसाधर्म्य सोडल्यास एकमेकांशी काहीही संबंध नाही. पाटणादेवी मंदिराचा परिसर मात्र नितांत सुंदर आणि चारही बाजूंनी
डोंगराने वेढलेला. मंदिराच्या समोर कण्हेरगडाचा खडा पहाड आणि मंदिराची
पाठराखण करत उभं आहे पितळखोरे लेणं. पाटणादेवीचं कोरीव कामाने सजलेलं
प्राचीन मंदिर पाहून बाहेर पडतानाच आमचे गाइड विजूमामा यांच्या येण्याची
आणि मंदिराच्या बाहेरील टपरीवर सांगितलेल्या चहावाल्याकडची साखर संपल्याची
खबर एकाच वेळी आली!! कण्हेरगडाच्या पोटात प्राचीन अशा सीतान्हाणी,नागार्जुन कोठडी आणि शृंगारचौरी अथवा शृंगारचावडी या लेण्यांचा समूह कोरला आहे. सर्वांत पहिली लागते ती नागार्जुन कोठडी लेणी. अतिशय सुंदर शिल्पकाम आणि भगवान महावीर,गोमटेश्वर आणि अंबिकेच्या भव्य मूर्ती या लेण्यात खोदल्या आहेत. लेण्यांच्या प्रवेशद्वारावरची हत्तींची शिल्पही प्रेक्षणीयच. शेजारी पाण्याचं टाकंही आहे. खास वेळ देऊन बघावे असे हे कातळकाम आहे. नागार्जुन कोठडीच्या पुढे लागतात ती सीतान्हाणी लेणी. यात मात्र नुसत्याच रिकाम्या खोल्या असून कोणतेही मूर्तिकाम केलेले नाही. सीतान्हाणीपासून पुढे आलो, की आपण पाटणादेवी गावाच्या बरोब्बर समोरच्या कड्यावर येतो. इथेच अतिशय सोप्या श्रेणीतला सुमारे पन्नास फुटांचा एक कातळटप्पा लागतो. पाटणादेवीचं गर्द जंगल नजरेत भरले. कण्हेरगडाच्या भग्न दरवाजातून माचीवर प्रवेश झाला तेव्हा नऊ वाजत आले होते. उजवीकडे किल्ल्याचा गोलाकार बालेकिल्ला लक्ष वेधून गेला. माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाताना मधे एक पाण्याचं कोरड टाकं असून पुढे काही भग्नावशेष आहेत. कण्हेरगडावरची सर्वांत भक्कम आणि कमालीची सुंदर वास्तू म्हणजे त्याचा दरवाजा. बालेकिल्ल्याच्या खाली एका अरुंद ठिकाणी दरवाजा बांधलेला असून, आत प्रशस्त देवड्या आहेत. दरवाजापासून एक कमालीची खडी चढाई कोरड्या टाक्यांच्या सोबतीने बालेकिल्ल्यावर घेऊन गेली. माथ्यावर कमरेएवढे गवत माजले होते. उकाड्याने घामटा काढलाच होता, त्यात वर पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष होते. त्यामुळे कण्हेरगडावर जाताना कमीत कमी तीन लिटर पाणी अत्यावश्यकच आहे. माथ्यावरच्या मारुतीरायाला दंडवत घालून आणि झेंडावंदन आटपून खाली उतरायला सुरुवात केली, तेव्हा बारा वाजत आले होते. वाटेत किल्ल्याच्या घळीतली शृंगारचावडी लेणीसुद्धा बघून झाली. या लेण्यांमध्ये फार काही नसून लेण्यांचा डोलारा पेलणारे खांब मात्र निखालस सुंदर कोरलेले आहेत. ही लेणी सापडायला मात्र स्थानिक माहीतगार सोबत हवाच. खाली उतरलो तेव्हा पायथ्याच्या महादेव मंदिराने मात्र आमचे पाय जड केले. कमालीचे सुंदर लोकेशन आहे मंदिराचे!! मंदिराबाहेर पडलो आणि मुख्य रस्त्यावरच्या गर्द राईत जेवण उरकून गाडी पुन्हा कन्नडचा घाट जेव्हा चढू लागली तेव्हा नजरेसमोर पेडका किल्ला तरळत होता. पेडका किल्ल्याला जायला चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावरील कालीमठ फाट्यापासून उपळी-आंबा तांडा- वडनेर व कळंकी असा मार्ग आहे. कळंकीचे सरपंच मात्र अतिशय अगत्यशील. अतिशय प्रेमाने त्यांनी आमची विचारपूस केली आणि वाट दाखवायला गावातली दोन-तीन मुले सोबतीला दिली. खरंतर पेडका किल्ल्याला वाटाड्याची अज्जिबात गरज नाही. पण आम्ही किल्ल्यावरून सूर्यास्त पाहून उतरणार असल्याने वाटेत अंधार पडणार होता आणि त्यासाठी स्थानिक माहीतगार आवश्यक होता. कळंकी गावापासून सुमारे दोन-तीन किलोमीटरवर पेडका किल्ल्याचा पायथा आहे आणि तिथपर्यंत मिनीबससारखे वाहन सहज जाऊ शकते. पायथ्याला पोहोचलो तेव्हा ठसठशीत कातळकडा लाभलेला आणि हिरव्यागार कायेवर संध्याकाळची कोवळी किरणे पडून उजळून निघालेला पेडका दुर्ग निर्विवाद सुंदर दिसत होता. एकूणच चढाईसाठी भन्नाट वातावरण होते. पेडका किल्ल्याची चढाई कमालीची सोपी असून मुख्य कातळकड्याच्या खाली जाईपर्यंत अर्धा एक तासाची आडवीच वाट आहे. माथ्यावर पोचलो तेव्हा पाच वाजत आले होते. किल्ल्याचा पसारा प्रचंड असून योग्य पाण्याची भरपूर टाकी किल्ल्यावर आहेत. पेडका किल्ला हा मी आत्तापर्यंत पाहिलेल्या सुमारे २५० किल्ल्यांमधील अनेक जे सर्वोत्कृष्ट किल्ले आहेत आहेत त्यातला एक असावा. योग्य ऋतूत गेल्यास हा किल्ला तुम्हाला जग विसरायला लावेल इतके सौंदर्य पेडका किल्ल्याला आणि मुख्य म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या आसमंताला लाभलेले आहे. पश्चिमेकडे असल्याने पेडका किल्ल्याच्या पुढे एकही डोंगर नाही आणि त्यामुळे इथला सूर्यास्त म्हणजे स्वर्गसुख आहे. आत्ताही मला त्याचे वर्णन करायला शब्द कमी पडत आहेत. त्यासाठी तुम्ही तिथेच असायला हवे. गावात परतलो तेव्हा अर्थातच अंधार पडला होता. गावातच रात्रीचं जेवण सांगितल्याने तशी काळजी नव्हती. चुलीवरच्या गरमागरम जेवणावर आडवा हात मारून बाहेर पडलो तेव्हा घरमालकाने सतरा जणांच्या जेवणाचे पैसे घ्यायला सपशेल नकार दिला. मी अवाकच झालो. साहेब...मी तुमच्या घरी येईन तेव्हा मला जेवणाचे पैसे मागाल का? नाही ना? मग तुम्ही पण द्यायचे नाहीत. काय बोलणार यावर. त्याच्या पाच वर्षाच्या मुलाच्या हातात खाऊसाठी दिलेले पैसे त्याच्याकडून काढून घेत आणि मला परत करत तो म्हणाला ‘आत्तापासून सवय लावू नका साहेब. खाऊसाठी का असेना...पण याला पैशांची सवय लागली तर आमचे संस्कार वाया जातील’. आयुष्याच्या डायरीत एका स्पेशल पानावर लिहून ठेवण्यासारखा हा अनुभव! आम्ही गावातल्या मारुती मंदिरात मुक्काम करणार म्हणून सरपंचांनी पाच सहा माणसं पाठवून मंदिर स्वच्छ करून ठेवले होते. या कळंकी गावाने म्हणजे धक्क्यामागून धक्के द्यायचा सपाटाच लावला होता. मारुती मंदिराच्या प्रशस्त आवारात मुक्काम पडला. आजची दिवसभराची वाटचाल आणि सूर्यास्ताची स्वर्गीय दृश्य डोळ्यासमोर तरळत असतानाच अंथरुणाला पाठ टेकली तेव्हा उद्याच्या दिवसाचे वेध लागायला सुरुवात झाली होती. कळंकीमधली पहाट उजाडली तीच मुळी मारुती मंदिरातल्या भजनांनी. पूर्व क्षितिजावर रंगपंचमीची सुरुवात झाली होती. बाहेर येऊन बघतो तर सरपंचांनी एका मावशींना चहा घेऊन मंदिरात पाठवलं होतं. एवढ्या राजेशाही पाहुणचाराची सवय नव्हती हो. सगळं आवरून आणि सरपंचांचे आभार मानून सात वाजता निघालो. आज राजदेहेर ऊर्फ ढेरीचा किल्ला आणि माणिकपुंज बघून परतीचा प्रवास सुरू करायचा होता. जातेगाव - ढेकू - नायडोंगरीमार्गे राजदेहेर किल्ल्याच्या जवळच्या गंगा आश्रमात पोचलो. गडाच्या वाटाड्याला आधीच फोन करून ठेवल्याने आम्ही यायच्या आधीच स्वारी पायथ्याला वाट बघत थांबली होती. गंगा आश्रमाच्या पुढे गडाच्या अगदी पायथ्याला श्रावणबाळ तळे आहे. याला श्रावणबाळ तळे नाव का पडले ते प्रभू रामचंद्रलाच ठाऊक. पायथ्यापासून पाहिल्यास राजदेहेर किल्ला सुळकेवजा दिसतो. गडाची उंची फार वाटत नव्हती पण दमट हवा घाम काढणार हे आता स्पष्ट जाणवत होते. गडाच्या सुळक्याचे फोटो काढण्यात आम्ही मग्न असतानाच आदरणीय गाईडसाहेबांनी ज्ञानामृताचा असा काही जहाल डोस दिला की आम्हाला वेड लागायचीच पाळी आली.. ‘साहेब...तुम्हाला माहितेय का...अफझलखानाला मारल्यावर शिवाजीमहाराजांनी या कड्यावरून आपला घोडा ढेरी किल्ल्यावर चढवला होता आणि औरंगजेब त्यांना शोधत आला होता.’ तो नक्की शुद्धीतच आहे ना हे मी सर्वांत आधी पाहून घेतले. पण या ठिकाणी एक लक्षात ठेवावे, हे स्थानिक लोक ना गिर्यारोहक असतात ना इतिहाससंशोधक. आपल्या गावात एक किल्ला आहे आणि त्यावर महाराज येऊन गेले या त्यांच्या भाबड्या भावनेचे खुल्या दिलाने कौतुक करावं...भले ते सांगत असलेली घटना कितीही अतार्किक का असेना. त्यामुळे त्यांच्या भावनेचा आदर करावा. राजदेहेर किल्ल्याला उजवीकडे ठेवत वाट आडवी जात होती. पाऊण तासात गडासमोरच्या पठारावर येऊन पोहोचलो. इथून गडाच्या विरुद्ध दिशेला जाणा-या वाटेला ‘अढाई शिडीचा घाट’ म्हणतात आणि तो तिथल्या जवळच्या जातेगाव महादेवाच्या डोंगरावर जातो. इथून पुढे गडाचा एक अतिशय सोपा कातळटप्पा पार करून फुटक्या तटबंदीतून आपला गडावर प्रवेश होतो. राजदेहेरचा विस्तार बऱ्यापैकी असून गडावर पाण्याची भरपूर टाकी,उध्वस्त अवशेष, तटबंदी, दरवाजाचे अवशेष इत्यादी वास्तू आहेत. माथ्यावरून दिसणारे नजारा मात्र अप्रतिमच आहे. विस्तारभयामुळे इथे सर्व अवशेषांचे वर्णन करता येणार नाही. गडावरून उतरताना गर्द झाडीने भरलेली एक नाळ थेट श्रावणबाळ तळ्यापाशी उतरते. वाटाड्याच्या कृपेने आम्ही तासाभरात खाली आलो आणि या भटकंतीमधला शेवटचा किल्ला असलेल्या माणिकपुंज किल्ल्याकडे आता प्रवास चालू झाला. राजदेहेरहून नायडोंगरी-जळगाव खुर्द- कासारी फाटामार्गे माणिकपुंज किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या माणिकपुंज गावात जाता येतं. गडाच्या पायथ्याला सुरेख कोरीवकाम असलेलं मंदिर असून त्याच्या आवारात काही निखालस सुंदर मूर्ती ठेवल्या आहेत. माणिकपुंज किल्ला चढायला वीस मिनिटे पुरे. गडाच्या वरपर्यंत स्थानिक गावक-यांनी पायऱ्या बांधलेल्या असून गडाच्या वाटेवर एक गुहा व पाण्याचे खांबटाके असून गडमाथ्यावरसुद्धा तुरळक तटबंदीचे अवशेष असून एक खांबटाके व भैरोबाचे ठाणे आहे. पण माणिकपुंजच्या माथ्यावरून दिसणारी अंकाई रांग म्हणजे जन्नत! जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. माणिकपुंज किल्ल्याचा परिसर मात्र अविस्मरणीय आहे. माथा सोडला तेव्हा पाच वाजत आले होते. मावळतीची किरणं आसमंतावर पसरायला सुरुवात झाली तेव्हा आम्ही मात्र पुढच्या भटकंतीचे बेत आखत गडमाथा उतरत होतो!! कन्हेर गडया इतिहासदुर्गाची उभारणी आठव्या शतकात झाली. येथे यादव सम्राट आणि त्यांच्या मांडलिकांचे राज्य होते. शके 1150 मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. या मंदिराच्या परिसरात खगोलशास्त्रज्ञ व गणितसूर्य भास्कराचार्यानी शून्याची संकल्पना मांडली आहे. त्याच्या वास्तावासंबधीचा शिलालेख येथे आढळून येतो. हा परिसर अतिशय नयनरम्य व मनमोहक निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. चाळीसगाव हे तालुक्याचे ठिकाण असून पाटणादेवी येथे येण्यासाठी मध्य रेल्वेने सहजपणे पोहचू शकतात. चाळीसगाव बसस्थानकावरुन दर तासाला पाटणादेवी या पर्यटनस्थळी जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. सकाळी साडेसहा वाजेपासून बससेवा आहे. बसने पाटणादेवी स्थानकाच्या दिड किलोमीटर अलिकडे महादेव मंदिर थांब्यावर कन्हेर गडासाठी उतरावे लागते. डाव्या हाताच्या खडकाळ पायवाटेने दहा मिनिटात मंदिरात जाता येते. मंदिराच्या मागून पंधरा मिनिटे चालल्यावर एक सिंमेटमध्ये बांधलेली मेघडंबरी येते. तेथून डाव्या हाताने जाणाऱ्या पायवाटेने कन्हेरगडचा डोंगर चढायला सुरुवात करावी. कन्हेर गडावर जाण्यासाठी असलेला प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. वाटेत दगडी पायऱ्या ही लागतात. पुढे दहा मिनिटात पायवाट उजवीकडे वळते आणि नागार्जुन गुंफापाशी पोचतो. उजवीकडे वळणाऱ्या वाटेवर शृंगारचौरी लेणी आणि डावीकडे वळणाऱ्या वाटेवरचा दगडी कातळ चढली की कन्हेरगडाची माची लागते. तिथून पुढे जात राहिले की गडाच्या माथ्यावर पोहोचता येते. पाहण्यासारखी ठिकाणे : हेमांडपती महादेव मंदिर उंच चौथऱ्यावर काळ्या दगडांनी बांधलेल्या ह्या पूर्वेकडे तोंड असलेल्या सुंदर मंदिराच्या चारी बाजूने अनेक मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्यावर गणेशपट्टी आणि सप्तमातृका आहेत. मंदिराचा सभामंडप आणि तेथील एक शिलालेख पाहाण्यासारखा आहे. हे मंदिर भारतीय पुरातन खात्याने संरक्षित म्हणून जाहीर केले आहे. मेघडंबरी नागार्जुन गुंफा या गुंफा इसवी सनाच्या नवव्या शतकात कोरलेल्या आहेत. येथे तीन दालने नक्षीकाम केलेले खांब, इंद्राची प्रतिमा, महावीराची एक व अन्य तीर्थकरांच्या मूर्ती आणि त्याच्यावर चवरी ढाळणाऱ्या सेवकाची एक मूर्ती आहे. सीतेची न्हाणी लेणी लेण्यांची ओवरी 18 फुट रुंदीची असून दोन्ही बाजूला साधे खांब आहेत. येथे प्रभू रामचंद्र येऊन गेले होते अशी आख्यायिका ऐकायला मिळते. शृगांरचौरी लेणी ही अकराव्या शतकातली हिंदू पद्धतीची लेणी आहेत. लेणी पाच खांब्यावर उभी असून आत काही शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत. पाटणादेवी मंदिराच्या परिसरात राहण्यासाठी वनखात्याच्या वतीने भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. चहा, नास्त्यासाठी स्थानिकांची दुकाने आहेत. सर्व लेणी, पुरातन मंदिरे आणि आसपासची सर्व ठिकाणे पाहण्यासाठी पाटणादेवीला दोन दिवसांचा मुक्काम करावा लागतो. - निलेश परदेशी चाळीसगाव, जि.जळगाव |






























































No comments:
Post a Comment