Tuesday, August 10, 2021

पितळखोरा लेणी

 पितळखोरे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावाजवळ पितळखोरे लेणी आहेत.ही भारतातील सर्वात जुनी लेणी आहेत असे मानले जाते. लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन मानली जातात.अत्यंत सुंदर आणि प्राचीन बौद्ध लेणी पाहायला पितळखोरा या ठिकाणी गेलेच पाहिजे. हे जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने संरक्षित केलेले आहे. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकामध्ये खोदलेली हीनयान पंथाची ही लेणी आणि तो सगळा परिसरच अत्यंत नयनरम्य आहे. गौताळा अभयारण्यात हा भाग येतो. लेण्यांमध्ये जाण्यासाठी उत्तम बांधलेल्या पायऱ्या आहेत. १४ लेण्यांचा हा समूह असून त्यातील चार चैत्यगृहे आहेत. त्यातील खांबांवर अत्यंत सुंदर रंगवलेली चित्रे आजही शाबूत आहेत. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली ती चित्रे खांबांचे आकार आणि खोदीव स्थापत्य पाहून आश्चर्याने बोटे तोंडात जातात. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून दगडी पन्हाळीचा केलेला वापर आणि ते पाणी थेट खालीपर्यंत नेऊन सोडायची तत्कालीन स्थपतींची दूरदृष्टी केवळ वाखाणण्याजोगी आहे. या लेण्यांच्या समोरील डोंगरामध्ये पण काही खोदीव गुहा असून त्यामध्ये स्तूप आहेत. कदाचित ते कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले असावेत.

पितळखोरा लेणि

पितळखोरा लेणि
पाटणा देवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली आसावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत.

उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.





पितळखोरा लेणी आणि पांढर्‍या रंगातील चिवर घातलेले सम्यक समबुध्द…!

LATEST

औरंगाबाद जिल्ह्यातील सातमाळ पर्वत रांगेतील कन्नड जवळील गौताळा अभयारण्यात आद्य लेणी असलेल्या “पितळखोरा लेणीच्या” विषयी अनेक वैशिष्ट्ये अनेक वेळा विशद केली आहेत त्याच्यात आणखी एक भर.
पितळखोरा लेणी अनेक अंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारणता इ स पूर्व दुसऱ्या शतकातील या लेणीवर इ स च्या पाचव्या सहाव्या शतकात महायान पंथाने भित्तीचित्रे तयार केली, यात सम्यक समबुध्द व बौध्दीसत्व यांनाच चितारण्यात आले आहे कदाचित ही भित्तीचित्रे अजिंठा लेणीत काढण्यात आलेल्या भित्तीचित्रांच्याही अगोदरची असण्याची शक्यता आहे.
कारण या भित्तीचित्रात मुख्य चैत्यगृहांच्या भिंतीवर स्तंभावर जातक कथांचे चित्रण न करता सम्यक समबुध्द व बौध्दिसत्व यांनाच चितारण्यात आले आहे तर जगाचे लक्ष आपल्या भित्तित्रांच्या मुळे वेधून घेणार्या अजिंठा लेणीत आपल्याला अनेक जातक कथांचे चित्रण पाहायला मिळते .
पितळखोरा लेणीत ज्या वैशिष्ट्य विषयी सांगत आहे ते म्हणजे “पांढर्या” रंगाचे चिवर परिधान केलेले सम्यक समबुध्द यांचे भित्तीचित्र.
लेणी क्रमांक तीन जे एक चैत्यगृह असून या लेणीत पुर्वी ३७ अष्टकोनी खांब होते आज त्यापैकी आता फक्त १२ खांब मूळ स्वरूपात शिल्लक आहेत त्यावर सुंदर असे सम्यक संबुध्दांचे चित्रण केलेले आहे भगव्या रंगाचे चिवर परिधान केलेले तथागत आपण इथे पाहु शकतो तर स्तूपाला वंदन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चंक्रमण अथवा प्रदक्षिणा पथाच्या डाव्या बाजुच्या भिंतीवर हे वैशिष्ट्यपूर्ण भित्तीचित्रे आपल्याला पहायला मिळते.
अष्टकोनी खांबांवर चित्रीत केलेली चित्रे थोडी प्राथमिक स्वरूपातील वाटतात तर प्रदक्षिणा पथावरील भित्तीचित्रे ही गंभीर स्वरूपाची वाटतात तसेच मानवीय वैशिष्ट्ये उत्कृष्टरित्या मांडण्यात कलाकारांने आपली कस पणाला लावल्याचे व कलेतील आपली ऊंची गाठल्याचे या चित्रातून प्रदर्शित होते तसेच चित्रातील रंगसंगती गडदपणा देखील या चित्रांना एक अती उच्च ऊंची प्रदान करते.
स्तंभावरची भित्तीचित्रे व बाजुच्या भिंतीवरील भित्तीचित्रे यांच्यात खूप मोठी तफावत दिसुन येते , स्तंभांवरील चित्रे जेवढी प्राथमिक स्वरूपाची दिसतात तेवढीच प्रगल्भ बाजुच्या भिंतीवरील भित्तीचित्रे दिसतात.
इथे असलेले बौध्दिसत्व देखील उत्कृष्ट चितारलेली आहेत बौध्दीसत्वांचे कुरळे केस व त्या केसांची चेहर्यावर आलेली एक बट आपले सर्वांचे लक्ष वेधून घेते.
या सर्व बाबी छोटे मोठे बारकावे पाहण्यासाठी आपल्याला एकदातरी पितळखोरा लेणीवर जावे लागेल.
किंवा आपल्या आसपासच्या एखाद्या लेणीवर जावे लागेल आता पावसाळा सुरू आहे इथला कातळ आता स्वच्छ व अधिक गडद होउन जाइल इथले धबधबे आता वाहू लागतील तसेच ओढे ही वाहू लागतील नवीन पालवी फुटलेली झाडे इथला वातावरण अगदी आल्हाददायक करून ठेवतील तेव्हा एक दिवस ठरवून लेणीच्या निसर्गाच्या सानिध्यात जा संपूर्ण वर्षभराची मरगळ दुर होऊन जाइल….!
मुक्त लेणी अभ्यासक
घणसोली, नवी मुंबई
९३२०२१३४१४









बौद्ध ग्रंथातील "पीतंगल्य" म्हणजेच पितळखोरा




पितळखोरा येथे १३ बौद्ध लेणी आहेत. औरंगाबाद पासून चाळीसगावकडे जाताना ६८ किलोमीटर अंतरावर पितळखोऱ्याची लेणी सातमल पर्वतात आहेत. लेण्यापर्यंत जाण्यास अजूनही रस्ता तयार झाला नाही. अजंठा सारख्याच अर्धवर्तुळाकार आकाराच्या दरीत ही लेणी खोदली गेली आहेत. दरीतून पाण्याचा ओढा वाहत जातो. एकेकाळी ही बौद्ध लेणी अत्यंत प्रेक्षणीय असली पाहीजेत. पण समोरचा बराचसा भाग पडल्यामुळे बहुतेक सर्व दर्शनी भाग आता नष्ट झाला आहे.

चैत्यगृहात बुद्धांची आणि बोधिसत्वांची सुंदर चित्रे काढली आहेत. येथे असलेल्या शिलालेखावरून ही लेणी इ.स. पूर्वी २०० साली खोदली गेली असली पाहीजेत. इसवी सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकात येथे महायानी बौद्धांनी वास्तव्य केल्याचे दिसते. खडकात आझळून येणाऱ्या दोषामुळे येथे जास्त खोदकाम झाले नसावे असे वाटते.

पितळखोर्‍याच्या चैत्यगृहातील दागोबाच्या एका खोबणीत स्फटिकाच्या करंडकात रक्षा सापडल्या. ह्या शोधामुळे भाजे, कार्ले इत्यादी चैत्यगृहातील दागोबाच्या खोबण्यातही अशाच प्रकारचे करंडक असले पाहिजेत असे पुराणवस्तुशास्त्राज्ञांचे ठाम मत आहे. पितळखोर्‍याच्या चैत्यगृहातील खडक वरून खाली खोदतांना तांबड्या मातीचा थर लागला. त्यातून आत चैत्यगृहात पाणी येऊ नये म्हणून वरच्या भिंतीच्या खडकातून पाणी जाण्यासाठी वाट करून दिली आहे. नंतर त्या भिंतीची व्यवस्थित दुरूस्ती करून वरून गिलावा दिला आहे. हे पितळखोर्‍याच्या वास्तूशिल्पाचे एक वैशिष्ट्य आहे.

टोलेमीच्या ग्रंथातील “पेट्रिगला” आणि “महामायापुरी” ह्या बौद्ध ग्रंथातील “पीतंगल्य” म्हणजेच हल्लीचे पितळखोर होय. महामायपुरी संकरीन नावाचा यक्ष “पीतगंल्य” म्हणजेओ पितळखोर येथे राहत होता असे म्हटले आहे.

 पितळखोरा लेणी व पाटणादेवी


पाटणादेवी व पितळखोरा ही दोन्ही ठिकाणे ऐतिहासिक महत्वाची आहेत. अजंठा सातमाळ डोंगर रांगेतील आम्ही भेट दिलेले हे चौथे ठिकाण होते. अजंठा लेणी, गोद्रि येथील धबधबा, अन्तुरचा किल्ला हे आधीचे तीन ठिकाणे होती. पैकी पाटणादेवी हे चाळीसगाव तालुक्यात जळगाव जिल्ह्यात  येते तर त्याच्या एक्झॅक्टवर असलेल्या डोंगरावरील पितळखोरा लेणी ह्या कन्नड तालुक्यात औरंगाबाद जिल्ह्यात  येतात.
आज आम्ही परत तीन जण होतो. नेहमीप्रमाणे आज देखील माझ्या सोबत इतिहासातील रसिक व्यक्तिमत्व सर्वश्री सुशीलकुमार अहिरराव 😋(हा खरा तर एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.....and i promised him when he got his post...i will write on him thoroughly) व राहुल नावाचा एक भावी अधिकारी आमच्या सोबत होता.   

चाळीसगाव पासून साधारण वीस-पंचवीस किलोमीटर अंतरावर पाटणादेवी हे ठिकाण आहे. नावावरून आपल्या लक्षात आले असेलच की हे एक देवीचे मंदिर आहे.  पण महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर 12 व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरांमध्ये त्याची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथ-यावर त्याची रचना पुर्वाभिमुख करण्यात आली आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार परिसरात हे देखणे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. 

आपण ज्या गावातून पाटनादेवी मंदिराकडे जातो ते गाव म्हणजे पाटण.  या गावाला देखील ऐतिहासिक व पौराणिक असे महत्त्व आहे. गणितातील प्रसिद्ध भास्कराचार्य हे या पाटण या गावामध्ये राहत असत आणि त्यांनी या ठिकाणी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ लीलावती लिहिला असे म्हटले जाते. भास्कराचार्य यांचे विज्जलबीड म्हणजे पाटणा हेच असावे, असा तर्क येथील एका शिलालेखावरून लावला जातो.

ज्योतिषशास्त्राच्या अध्ययनासाठी त्यांनी या ठिकाणी एका मठाची स्थापन केली होती. त्यांचा नातू चांगदेव यानेही अध्ययनाची प्रथा याच मठाच्या माध्यातून सुरू ठेवली होती. आजही काही शिलालेख या ठिकाणी पाहायला मिळतात. देवी मंदिराच्या परिसरात वनविभागाची अनेक केंद्र भास्कराचार्य यांच्या नावावरून देण्यात आलेले आहेत.

पाटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, पितळखोरे लेणी, हेमाडपंती महादेव मंदिर, सीता न्हाणी नामक लेणे, शृंगारचौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गौताळा अभयारण्य आहे.


देवीच्या मंदिराचा परिसर आपले लक्ष वेधून घेतो........पाठीमागे काही अंतरावरील सातमाळा डोंगररांगेतून कोसळणारा धबधबा नयन रम्य दिसतो.....आम्ही पोहचलो तेव्हा मंदिर परिसरात चिटपाखरू देखील नव्हते मंदिराच्या शेजारीच वाहत असलेल्या एका नदीला ओलांडून पलीकडे गेल्यानंतर जंगलात थोडावेळ चालल्यावर उजव्या बाजूला एका धबधब्याकडे जाण्याचा रस्ता लागतो.  मध्ये दोन तीन वेळा पाण्याचा प्रवाह ओलांडून जावे  लागते. ऐन पावसाळ्यात गेल्यास ती जोखीम घेऊ नये कारण पावसाळ्यात अशा नद्यांना वर पडलेल्या पाण्यामुळे अचानक पूर येऊ शकतो. आम्ही ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात गेल्यामुळे वातावरण छान होते. त्यातच या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे सर्व वातावरण हिरवगार होतं. नद्यांना देखील पानी कमी होत.  त्यामुळे त्यांना ओलांडून जाणं शक्य होतं. धबधब्याच्या परिसरात जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा फक्त पाण्याचा आवाज येत होता व जंगलभर शांतता पसरलेली होती.  धबधब्याची मुख्य धारा ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी एक डोह तयार झालेला होता व त्यातून पाण्याचा प्रवाह नदीच्या रूपात  ज्या मार्गाने आम्ही आलो त्या मार्गाने  खाली जात होता.  डोहाच्या  परिसरातील शांतता ही इतकी वेधक व आकर्षक होती की,  आपल्या आतल्या  आवाजाला ती आवाज देत होती.  त्या ठिकाणी जवळपास अर्धा तास आम्ही त्या शांततेचा,  पाण्याच्या आवाजाचा आणि निसर्गाचा आनंद घेतला.

परत निघतांना सोबत आणलेला नाश्ता केला व आम्ही पितळखोऱ्याच्या रस्त्याला लागलो. थोडे सपाटीचे पण जंगलातील अंतर पार केल्यावर वन विभागाचे छत्री बांधकाम सुरू होते. मागील अनुभवावरून तेथे काम करणाऱ्या मजुरांना वरती जाण्याचा रस्ता  विचारला त्यांनी जवळपास अर्धा तास वर चढायला लागेल असे सांगितले व हाच रस्ता पुढे जातो त्याला सोडू नका असे देखील त्यांनी आम्हाला सांगितलं. आतापर्यंत गाडी वाटेचा असलेला रस्ता आता छोटा झालेला होता व जंगलातली पाऊलवाट ज्याला आपण म्हणतो त्याची सुरुवात झाली होती अर्थात ही पाऊलवाट म्हणजे डोंगर  चढण्याची वाट.  मध्येच लागत असलेल्या  पायर्‍या  तर कधी निव्वळ डोंगर , दगड व मातीचा रस्ता चढत जावे लागत होते.  अंतुर किल्ल्यासारखी मध्येच चढ नंतर परत सपाट अशी परिस्थिती येते नव्हती.  तर सरळ असा वर चढत जाणारा मार्ग असल्यामुळे प्रचंड दमछाक झाल्यासारखे वाटत होते पण आता ट्रेकिंग हा विषय नेहमीचा  झाल्यामुळे या थकण्याचाही आनंद घेता येत होता. मध्येच मागे फिरून पाहिले असता उंचावरून दिसणारा संपूर्ण परिसर  हिरवागार दिसत होता.... हा ऑक्टोबर महिना होता ...अजून काही दिवसात पानझड सुरू झाली की हे सुंदर दृश्य दिसणार नाही. 


एका टप्प्यावर पानी पिण्यास थांबलो तेव्हा खाली पाहिले असता दाट झाडीत देवीचे मंदिर अगदीच चिमुकले दिसत होते. दूरवरील वनविभागाचे रेस्ट हाऊस व टेहळणी मनोरे देखील दिसत होते. कदाचित आता अगदी जवळ राहिले असावे पण सोबत असणारा मित्र म्हटला, 'अजून बरेच अंतर आहे आपण अशा टप्प्यावर जाऊ तेथून हा खालील परिसर देवीचे मंदिर काहीच दिसणार नाही. 

आता हा शेवटचा टप्पा थोडा त्रासदायक  जरी जाणवत असला तरी दाट झाडी व गवतामुळे उन्हाचा त्रास नव्हता.....हुश.. आणि ते सर्वोच्च टोक आले जिथे आमचे चढणे पूर्ण थांबले. त्या ठिकाणी असलेल्या झाडाखाली थोडावेळ थांबून आम्ही परत चालण्यास सुरुवात केली. आता डोंगराच्या पोटाला कडेकडेने बनलेल्या सपाट रस्त्यावर अजून काही अंतर चालत जायचे होते. मध्येच एक नदी आली. कदाचित ही तीच नदी असावी जिच्यावरचा धबधबा आम्ही खाली पाहिला. आता दोन डोंगर ज्या ठिकाणी भेटता त्या मीटिंग पॉइंटकडे रस्ता जातांना दिसत होता. 

एक क्षण असा आला की, समोर रस्ता आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडला.  कारण तो रस्ता दाट झाडी व उंच गवताने पूर्ण झाकून गेला होता.आमच्या उजव्या बाजूला नदी वाहत होती.... ती गवत, झाडी व जाळींमुळे दिसत नव्हती फक्त पाण्याचा आवाज येत होता. तसेच दोन तीन पावले टाकले असता ....... पलिकडच्या बाजूला एक बांधलेला सरळ कठडा दिसला जो कदाचित पुरातत्व खात्याने बांधला असावा.... मी पार पूर्वी कॉलेजला असतांना कधीतरी आलो होतो पण त्या स्मृती पुसट झाल्या होत्या. 

मग आम्ही त्या जवळपास बंद झालेल्या पाऊलवाटेने तसेच चालत गेलो. आणि एकदम आम्हाला  थेट लेणीचे दर्शन झाले. बाजूलाच वाहत असलेल्या नदीच्या किनारी पाण्याचा आवाज यीत असतांना ही दोन अडीच हजार वर्षांपूर्वीची लेणी पाहत असतांना लईच भारी वाटत होते.    

पितळखोरे येथील बौद्ध लेणी औरंगाबाद जिल्ह्यातील सातमाळा पर्वतरांगांत कन्नड तालुक्यात येतात. एकूण १४ लेण्यांचा हा समूह प्राचीन भारतातील लेण्यांच्या निर्मितीतील  पहिल्या टप्प्यातील आहे. सह्याद्री पर्वतरांगांतील इतर लेणी समूहांप्रमाणे या लेण्यादेखील पश्चिमेकडील सोपारा (शुर्पारक), कल्याण  व भडोच (भरूकच्छ) सारखी प्राचीन बंदरांना देशांतर्गत असणार्‍या पैठण व तगर (तेर)  आणि उत्तरेकडील उज्जैन सारख्या नगरांना जोडणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावर निर्माण केल्या असाव्यात. पितळखोरे हे टॉलेमीने वर्णन केलेले ‘पेट्रीगल’ आणि ‘महामायुरी सूत्र’ या बौद्ध ग्रंथात वर्ण केलेले ‘पितंगलय’ हे शंकरी नावाच्या यक्षाचे स्थान असावे.


येथील लेण्यात ‘भारवाहक यक्ष, द्वारपालांची जोडी, पंख असलेल्या अश्वांची जोडी, बाह्यभागावरील हत्तींची मालिका या विशेष मूर्ती आहेत.

येथे एकूण 14  बौद्ध लेण्या आहेत. ज्यांचा समावेश महाराष्ट्रातील आद्य मठांमध्ये केला जातो. सर्व लेण्या हिणयानकालीन असून महायानकालीन स्थापत्य रचनेचा कोणताही पुरावा येथे दिसून येत नाही. लेणी क्रमांक 3 मधील केवळ चित्रांमुळे महायान कालखंडाचे अस्तित्व दिसून येते. लेणी दोन समुहांमध्ये विभाजित असून दरीच्या उजव्या बाजूस असणाऱ्या प्रथम तर डाव्या बाजूस द्वितीय समूह आहे. त्यापैकी सहा चैत्यगृह आणि इतर विहार आहेत. विहारांचे विधान अत्यंत साधे असून यात आयताकृती खोलीत आतल्या बाजूच्या व मागील भिंतीत कक्ष खोदलेला आहे. यात दगडातच खोदलेल्या पलंगाची व कोनड्यांची व्यवस्था आहे. विहारांमध्ये लेणे 4 विशेष उल्लेखनीय आहे. या लेण्यांचा मंडप विशाल असून पाठी मागच्या भिंतीत सात कक्ष खोदलेले असून त्याचे छत घुमटाकार आहे. दर्शनी भागावर शिलाकृतींनी अलंकरण केलेले आहे. या लेण्याच्या समोर थोडे खालच्या बाजूस असणारे विस्तृत अंगण लेणी क्रमांक एक दोन व तीन यातही विभागलेले आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस खर्‍या मनुष्याकृती एवढे द्वारपाल असून  द्वारशीर्षावर गजलक्ष्मी आणि द्वारशाखेवर पुष्पाकृती कोरलेल्या आहेत. सहा चैत्यगृहपैकी लेने 3 स्थापत्याचा योजनेसाठी उल्लेखनीय आहे. ज्यात गजपृष्टाकार  प्रार्थनागृहांचे विभाजन भिंतीत समांतर असणाऱ्या  खांबामुळे मध्यभाग व प्रदक्षिणा पथात झालेले दिसून येते. यातील उजव्या बाजूच्या रांगेतील दहाव्या व अकराव्या खांबांवर शिलालेख आहेत. त्यात हा स्तंभ गंधिक(अत्तर बनवणारे) कुळातील मितदेवाचे दान आहे व दुसऱ्या खांबावर हे संघकाच्या पुत्राचे दान आहे, असा उल्लेख आहे. हे सर्व दाते प्रतिष्ठान म्हणजे आजच्या पैठणचे रहिवाशी होते. पितळखोरा पश्चिम भारतातील शैलस्थापत्याच्या अध्याय केंद्रांपैकी एक असून यातील स्थापत्यरचना व कलात्मकतेच्या दृष्टीने नव्हे तर धार्मिक सामाजिक व आर्थिक अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

प्रस्तुत लेण्यांमध्ये एकूण ११ कोरीव लेख आहेत. पैकी ७ लेखांची नोंद बर्जेस व इंद्रजी  यांनी केली आहे आणि १९५९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या उत्खनन अहवालात एम एन देशपांडे यांनी ४ नवीन लेखांची नोंद केली आहे. सर्व लेख ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेमध्ये कोरलेले आहेत. एकाही लेखामध्ये कालनिर्देश नाही. परंतु अक्षरवाटिकेच्या आधारे हे लेख इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सनाचे पहिले शतक या काळात कोरलेले असावेत.
लयनस्थापत्याच्या पहिल्या टप्प्यात निर्माण झालेल्या इतर लेण्यांत सातवाहन आणि शक राजवंशाचे लेख दिसून येतात. पितळखोरे येथे या राजांचे लेख नाहीत. मात्र याच लेण्यामधील विविध लहान खोल्यांच्या भिंतींवर कोरलेले चार लेख राजवैद्य मगिल आणि त्याच्या कुटुंबियांचे आहेत. मगिल हा वच्छि याचा पुत्र होता. स्वत:स राजवैद्य म्हणवणारा मगिल हा तत्कालीन महत्वाच्या राजघराण्याच्या सेवेत असावा. अशाच प्रकारे नण्ण वैद्य याने कान्हेरी येथे आणि वैद्य इसिरखित आणि त्याचा पुत्र वैद्य सोमदेव यांनी कुडा येथे दान दिल्याचे ब्राह्मी शिलालेखांत नोंद केले आहे. मात्र मगिल प्रमाणे हे वैद्य स्वत:स राजवैद्य म्हणवत नाहीत.
चैत्यगृहाच्या शेजारील क्र. ४ च्या लेण्यातील छोट्या खोल्यांच्या भिंतींवर हे चार शिलालेख कोरलेले आहेत. एम. एन. देशपांडे यांनी नव्याने केलेल्या उत्खननात चार नवीन शिलालेख प्रकाशात आले. अक्षरवाटिकेच्या आधारे हे लेख इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असावेत. यातील दोन लेख गुंफा क्र. ४ मध्ये आहेत. 

याच गुंफेमध्ये पंख असलेल्या घोड्याच्या शिल्पावर एक लेख आहे.हे दा कण्ह या समस याच्या पुत्राने दिले आहे. या लेखात देखील दानकर्त्याविषयीची अधिक माहिती नाही मात्र आवर्जून केलेला त्याच्या धेनुकाकट या गावाचा उल्लेख विशेष आहे. या गावाचा निश्चित ठावठिकाणा समजत नाही. मात्र धेनुकाकट हे इसवी सनाच्या सुरुवातीच्या काळातील एक महत्वाचे व्यापारी केंद्र असावे. कार्ले येथील चैत्यगृहातील स्तंभांवर धेनुकाकटच्या पंधरा दानकर्त्यांची नावे कोरलेली आहेत. त्यातील सहा यवन आहेत. शेलारवाडी येथे धेनुकाकटच्या (धेनुकाकडे) नंद याचे दान नोंदले आहे.

गुंफा क्र. ५ समोर पडलेल्या एका दगडावर एक खंडित लेख आहे त्यानून फारसा अर्थबोध होत नाही. 

ठिसूळ दगडामुळे पितळखोरे येथील लेण्यांची बांधणीपश्चातच पडझड सुरु झाली होती हे येथील प्राचीन काळातील जीर्णोद्धारावरून दिसून येते. तशातच चैत्य लेणे क्र. ३ आणि लेणे क्र. ४ येथील स्तंभांची बरीच पडझड झाली आहे. त्यामुळे अजूनही काही शिलालेख नष्ट झाल्याची शक्यता आहे.

या लेण्यांकडे जाण्यासाठी कन्नड घाट चढून वर गेल्यास सोपा रस्ता लागतो ज्याला ट्रेकिंग ची गरज नाही. असे त्या मार्गाने आलेले लोक दिसत होते. 

लेण्या पाहून झाल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. उतरतांना साहजिकच वेळ कमी लागला. खाली आलो तेव्हा नदीच्या पाण्यात हात पाय धुतांना खूपच मस्त वाटत होत....आज एकाच वेळी नैसर्गिक व ऐतिहासिक स्थळाला भेट दिल्याचा आनंद सोबत घेऊन आम्ही चाळीसगाव च्या  रस्त्याला लागलो. 

- समाधान महाजन 


संदर्भ - १) लेणीजवळ पुरातत्व खात्याने लावलेली माहिती.

 २)डॉ   रुपाली मोकाशी यांचे पितळखोरा लेनीबाबतचे आर्टिकल

.३)मराठी  विश्वकोश मधील लेणी 

४) मटा व दिव्य मराठीतील लेख


पितळखोरे लेणी, कन्नड, औरंगाबाद


पितळखोरे लेणी, कन्नड, औरंगाबाद

पितळखोरे लेणी, कन्नड, औरंगाबाद –

“राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा…!”

या ओळी खर्या अर्थाने महराष्ट्राला भूषावहच आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.आपल्या सह्याद्रीतील माणसे जशी वरुन काटक कणखर तेवढीच मनाने मायाळू,त्याच प्रमाणे सह्याद्रीतील दगडही वरुन कणखर पण आतून तितकाच मृदू. आपल्या सह्याद्रीचा गाभा हा कणखर व विशेष म्हणजे एकसंधी आहे.त्यामुळे छन्नी व हातोड्यांनी खोदकाम करण्यास अनुकूल आहे.भारतामध्ये लेणी खोदण्याची प्रथा सुरु झाली त्या काळात व जो पर्यंत हि प्रथा आपल्याकडे सुरु होती तो पर्यंत अनेक सत्ता या ठिकाणी आपले राज्य गाजवून गेल्या.मात्र जोपर्यंत लेण्या खोदल्या जात होत्या त्या काळांत या सत्ता खर्या अर्थाने प्रबळ होत्या,त्यांच्या स्वातंत्र्यलक्ष्मी अबादीत होती,त्यांच्या राज्यात आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक संपन्नता नांदत होती.हे लेण्या जो पर्यंत खोदल्या जात होत्या तो पर्यंत वरील सर्व बाबी राज्यात होत्या याचे ‘लेण्या’ हे सर्वात मोठे व जिते जागते उदाहरण होय.लेण्यांमुळे सुबत्ता होती असे नव्हे मात्र हे असे खोदकाम एका स्थिरस्थावर व ऐश्वर्यसंपन्न राज्याचे धोतक होय.(पितळखोरे लेणी)

सातवाहन,वाकाटक चालुक्य,राष्ट्रकूट या राजसत्तांनी येथे आपले राज्य ज्या पद्धतीने चालविले त्याचे अनेक धडधाकट पुरावे आपल्याला या लेण्यांतील शिलालेखांमुळे मिळतात.याच कालखंडात भारताचा इतर राज्यांशी चालू असलेला व्यापार व त्यातून मिळणारे उत्पन्न,व्यापारविषयक अनेक चांगली धोरणे,परदेशांशी असेलेले आपले सबंध हे सर्व सर्व या लेण्या अगदी आपल्याशी आजही  बोलतात जणू….!

कार्ल्याच्या लेण्याचे उदाहरण घेतलं तर लक्षात येत की,वैजयन्तीचा व्यापारी भूतपाल याने हे कार्ल्याचे लेणे उभारले असा निर्देश तेथील शिलालेखात मिळतो अर्थात हे कार्य काही अगदीच एकट्याचे नव्हे, लेण्याजवळील समाजाचेही देणे तेथे आहेच.प्राचीन काळात व्यापार हा संघाच्या मार्फत चालत होता त्या संघांनी या सांस्कृतिक कार्यासाठी देणग्या दिल्याचे, त्याचप्रमाणे धनाढ्य व्यापारीच काय पण परिसरातील सामान्य लोकांनीही या विधायक कार्यासाठी देणग्या दिल्याचे उल्लेख अनेक लेण्यांतून आपल्याला अढळतात.धार्मिक बाबतीत सलोख्याची भावना हि आपल्याकडे काही जुनी नाही ती पुर्वापार चालत आलेली आहे.सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर जशी अनेक संग्राम झालेली धारातिर्थे आहेत तशी अनेक धर्मक्षेत्रे सुद्धा आहेत.ती अनेक पंथांची आहेत, धर्मांची आहेत हा या मातीचाच जणू गुण आहे.पण,हि सहिष्णुता व धार्मिक सलोख्याची भावना कोठपर्यंत? जोपर्यंत त्यात दगाभटक्याची व स्वातंत्र्यलक्ष्मीला धोका पोहोचण्याचा संभव नाही तोपर्यंतच.मात्र यांत काही दगाफटका व आक्रमणाचा संभव असेल मग मात्र आपणा सर्वांना ठावूकच आहे…!

याच धार्मिक सलोख्याचे उदाहरण म्हणजे सह्याद्रीत असलेली बौद्ध, जैन व ब्राम्हणी लेणी होय.

लेणी हा खोदकामाचा प्रकार बहुतांशी पणे महाराष्ट्राशी जोडलेला आहे.कारण,लेणी हा सुद्धा अस्सल मराठीच शब्द होय.खोदणे व कोरणे हे सुद्धा दोन अस्सल मराठी धातूच होत.त्यामुळे, मराठ्यांचा फार पुर्वीपासून या खोदकामांशी सबंध असल्याचे अनेक इतिहासकार सांगतात मान्य करतात.सह्याद्रीत हि आज आडवाटेला असणारी म्हणजे खर तर वाटणारी बरं का…!

एके काळी येथूनही व्यापाराचे आजच्या प्रमाणेच सामान वाहतूकीचे भरदार रहदारी असणारे मार्ग होते.या मार्गांवरील लेण्या हि आपल्याकडील आपल्याला ज्ञात असलेली सर्वात जूनी धर्मक्षेत्रे आहेत.आपल्या पुराणांत व धर्मग्रथांत अशा प्रकारच्या धर्मक्षेत्रांचा उल्लेख आपल्याला अढळतो फक्त थोडाफार नावाचाच काय तो इकडे तिकडे फरक होय.

आपल्याकडे सर्वात प्राचीन धर्मक्षेत्रांत नाशिक व औरंगाबाद हा परिसर या बाबतीत सर्वात महत्वाचा परिसर होय.महाराष्ट्राचा प्राचीन ते मध्ययूगीन अभ्यास केल्यावर लक्षात येते की,तात्कालीन काळातील राजसत्तांच्या राजधान्या या यांच परिसरात होत्या.शकांसोबत त्याच प्रमाणे क्षत्रप व अभिरांशी सातवाहनांचे जे संघर्ष झाले ते याच परिसरांत झाले.

शुर्पारक(नालासोपारा), कल्याण व चौल ही त्याकाळची पश्चिम समुद्र किनार्यांवरील बंदरे व मथुरा वाराणसी व पाटलीपुत्र यांसारखी उत्तरेकडील ऐश्वर्यसंपन्न शहरे यांना जोडणारे महत्वाचे मार्ग म्हणजे पैठण व तगर या महाराष्ट्रांच्या अंतर्भागातून जात होते.याच मार्गांच्या काठांवर जागोजाग अनेक लेणी खोदलेली आपल्याला अढळतात पैकीच एक सर्वात प्राचीन असलेली हि “पितळखोरे’ लेणी होय.प्राचीन व मध्ययुगीन कालखंडात जसे भारताने सोबत महाराष्ट्राने अनेक सत्तांतरे पाहीली याही लेणीने अनेक सत्तांतरे पाहीली.लेण्यांचे मुख्य दोन प्रकार पडतात ऐहिक लेणी व धार्मिक लेणी यांत ऐहिक लेणी महाराष्ट्रात एकच आहे ती म्हणजे नाणे घाटातील सातवाहनांची लेणी.या लेण्यांत त्यांच्या पुर्वजांच्या प्रतिमांची किर्ती या लेण्यांतील शिलालेखांत वर्णिलेली आहे, थोडक्यात हे देवकूल किंवा किर्तीमंदिर होय.लेण्यांचा दुसरा प्रकार म्हणजे धार्मिक लेणी याचे तिन उपप्रकार पडतात.

बौद्ध,जैन व ब्राम्हणी लेणी.

पैकी महाराष्ट्रात बौद्ध लेण्यांची संख्या सर्वात जास्त आहे तर,महाराष्ट्रात मुख्य जैन लेणी ‘वेरुळ’ येथील होय.तर ब्राम्हणी प्रकारातील मुख्य लेणी एक म्हणजे घारापुरी(एलिफंटा) दुसरी म्हणजे वेरुळ येथे.

बौद्ध लेण्यांचेही कालानुरुप प्रकार  पडतात.

१)ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकापासून ते ख्रिस्तोत्तर दुसर्या शतकापर्यंत.

२)पाचव्या शतकाच्या मध्यापासून ते सातव्या शतकाच्या मध्यापर्यंत.

३)सातव्या शतकाच्या मध्यापासून ते दहाव्या शतकाच्या अखेरी पर्यंत.

ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकाच्या अखेर पर्यंत भारतात मौर्य सत्तेचा होत असलेला र्हास व सम्राट अशोकांच्या मृत्यूनंतर जणू बौद्धांचे धर्मकार्य थांबले होते.पण,पुढे सातवाहन काळात सातवाहनांची सत्ता महाराष्ट्रात प्रबळ असेपर्यंत लेण्यांसारखी धर्मकृत्ये झाली मात्र सातवाहनांच्या अस्तापासून ते चालुक्यांची सत्ता महाराष्ट्रात प्रबळ होई पर्यंत लेण्यांची फारशी निर्मिती अढळत नाही.याची अनेक कारणे आहेत जसे केंद्रीय सत्तांचा अभाव, राजकीय धमाधूमी या कारणामुळे व्यापाराला आलेली उदासिनता व परिणामी राज्यात आलेले आर्थिक दौर्बल्य.

यातील पहिल्या कालखंडात निर्माण झालेली लेणी हि ‘हीनयान’ पंथांची आहेत.कारण या लेण्यांत बौद्धांच्या मुर्ति अढळत नाही.कारण,या काळात गौतम बुद्धांना देवत्व प्राप्त झालेले नव्हते.भाजे, कोंडाणे,अजंठा(क्र.९ व १०),नाशिक व कार्ले या लेणी या सर्व ‘हीनयान’ पंथांची आहेत.त्याचप्रमाणे ‘पितळखोरेें’ ही लेणी देखील ‘हीनयान’पंथाची लेणी आहे.महायान पंथाच्या खोलात जात नाही पण सर्वसाधारणपणे ग्रिकांच्या आक्रमणानंतर त्यांच्या सोबत त्यांच्या धार्मिक कृत्यांना आपलेसे करत व मुर्तीपूजेला स्थान देत अनेक देवदेवतांचा स्विकार बौद्ध भिक्षुकांनीही केला, तसेच त्यात परावर्तनही केले.बौद्ध धर्माच्या पुनर्घटनेसाठी कनिष्कपूर येथे विख्यांत विद्वानांची एक सभा भरली येथ पासून पुढे ‘महायान’ पंथाचा प्रारंभ झाला.

(हि माहीती थोडक्या स्वरुपात आहे.)

पितळखोरे या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत.मुख्य लेणं म्हणजे एक मोठा चैत्य आहे.चैत्य या शब्दाच्या अनेक इतिहासकार संशोधकांनी वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत पैकी  एक निष्कर्ष म्हणजे,

”चैत्य ही संज्ञा पूजा प्रतिकाची धोतक आहे,मग ही वस्तु जडदेहाचा विषय असो किंवा पूज्य व्यक्तीच्या वापरातील काही वस्तू असो अगर अशा व्यक्तीची मुर्ती असो, अथवा धर्मचक्र वा त्रिरत्न यासारखे प्रतिक असो.”

चैत्यगृहात वरील संज्ञेतील एखादा अवशेषावर स्तूप उभारलेला अढळतो.यांतील स्तूपाचा आकार हा वर्तुळाकार का असतो याबाबत मात्र संशोधकांचे एकमत नाही.कदाचीत त्या काळी अशा प्रकारची घरे होती म्हणून असा आकार आहे असेही मत काही इतिहासकारांचे आहे.पण हे तितके प्रमाणबद्ध वाटत नाही.कारण,स्तूपाचा आकार हा पालथ्या भिक्षापात्रासारखा असावा असे बुद्धांचे वचन आहे.

जमिनीलगत वर्तुळाकार बैठक,त्यावर अंडाकृती घुमट, त्यावर चौकोनी हर्मिका आणि टोकावर छत्र अशी स्तूपाची उभारणी असते.

*स्तूपाची पूजा पुष्पे, धूप, दिप इत्यादींनी केली जात असे.या सर्वांत दिपाला विशेष महत्व होते.स्तूपासमोर सतत दिवा तेवत ठेवणे हे पुण्यप्रद मानले जाई.यासाठी काही विशेष दाने दिलेली अढळतात.

पितळखोरे लेणी या लेणीच्या मधील भागात ३५ स्तंभ असून  रंगात रंगवलेली बौद्ध भिक्षुकांची चित्रे आहेत.माझ्यामते हि चित्रे नंतरच्या काळातील असावीत.

चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर(एका सरळ रेषेत उभे असलेल्या हत्तींचा समूह) चौथऱ्यावर दाखविलेला हा गजथर हा एक उत्तम शिल्पकलेचा नमुना आहे व असा गजथर हा आपल्या शिल्पकलेत एकमेवच बघायला मिळतो. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दाखविल्या आहेत.हत्ती म्हणजे ऐश्वर्याचे प्रतिक,सोबत शक्तीचेही.या लेण्याचा संपुर्ण भार हा या हत्तींनी पेलला आहे असा याचा अर्थ आहे.या लेण्याच्या(क्रं४) प्रवेश द्वारावरील द्वारपाल अप्रतीम  आहेत.मात्र सर्वभक्षी कालाने या सुंदर द्वारावरील एक द्वारपालाची मुर्ती नष्ट झाली आहे.या द्वारावर सुंदर अर्धकमळ व त्रिरत्नांचे नक्षीकाम केलेले आहे.पुर्वी येथे द्वाराच्या वरच्या  बाजूचे एक शिल्प होते ते निखळून खाली पडले होते ते हल्ली मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्राहलयात आहे असे समजले.

या लेण्यांची हल्ली बर्यापैकी डागडूजी पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेली आहे.OWEN C. KAIL यांच्या BUDDHIST CAVE TEMPLES OF INDIA   या पुस्तकातील पितळखोरे लेणी या लेणीची जुनी छायाचित्रे पाहिल्यास फारच वाईट अवस्थेत या लेणी होत्या.खुप ठिकाणी झालेली पडझड इतरस्त पसरलेले दगड,मातीचे साम्राज्य यातून निदान थोड्याफार प्रमाणात यातून या लेण्यांची सुटका झालेली आहे.

पितळखोरे लेणी तेथे असणारे पहारेकरी आपापल्या परीने ठिल्लार व वाचाळविरांना आवरण्याचे काम करताना अढळले हि देखील एक सुखद बाब आहे.नाहीतर आपल्याकडे भिंतींवर नावे कोरणार्या स्वयंघोषित प्रेमविरांची कमतरता नाहीच की…! सोबत विनाकारण अशा जुन्या वास्तूंची तोडफोड करणार्या बेजबाबदार पर्यटकांचीही कमी नाही.असो.

वरील माहीती अत्यंत थोड्या प्रमाणात आहे.संपुर्ण लेणी अभ्यासायची म्हटले तर प्रथम आपल्याला बौद्ध भिक्षुकांच्या व बौद्ध धर्माच्या खोलात जावे लागेल.त्यांचे आचार विचार विहार याचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल.’चतुदिससंघ’, ‘उपोसथ विधी’, ‘प्रतीमोक्ष विद्या’ वगैरे संज्ञांचा अभ्यास करणे देखील गरजेचे आहे.

*चैत्यगृहांजवळ जी पाण्याची टाकी खोदली जातात त्यांना ‘पोढी’ ही संज्ञा आहे.

*चैत्य व विहार लेण्यांची व्यावस्था एक प्रमुख भिक्षूकडे असे त्याला ‘महास्वामी’ ही संज्ञा होती.

*भिक्षूंच्या राहण्याची, जेवणाची, औषध पाण्याची सोय व्हावी या करिता व्यापारी लोक व्यापारी पेढ्यांमध्ये कायम ठेवी ठेऊन करत असत.नाशिक येथील क्र. १० च्या लेण्यात याबाबत उल्लेख आहे.

या लेण्या, गडकिल्ले, प्राचीन मंदिरे यांचे निर्माण काही एका रात्रीत घडलेले नाही यांत कित्येक पिढ्या राबलेल्या आहेत.वर्षानुवर्षे छन्नी व हातोड्यांनी या मनमोहक कलाकृती साकारत आपल्या देशाच्या उदात्त संस्कृतिचा हा वारसा आपल्यासाठी आपल्या पुर्वजांनी तयार करुन ठेवलेला आहे.या कृत्यांमागे स्थानिक व केंद्रीय राजसत्तांचाही यात तेवढाच भरभक्कम सहभाग आहे.या धर्मकृत्यांसाठी लागणारा पैसा तो काही थोडाथिडका लागलेला नसणार यात शंकाच नाही यातून आपल्या मातीतील व जनमाणसांतील दानशूरता व धार्मिक सहिष्णूता या अंगच्या गुणांचा प्रकटपणा व्यक्त होताना आपल्याला दिसतो.लेणी हा असा प्रकार आहे जिथे चुकीला जरासुद्धा वाव नाही एखादे लेणे अगदी जरा जरी चुकले तरी ते लेणे तसेच सोडून जावे लागत असे,यातून पैशाचा, वेळेचा व श्रमाचा अपव्यय हे नुकसान काही थोडके नव्हते.किती प्रि प्लान व शांत चित्त व शांत डोक्याने राबलेल्या पाथरवट,कारागिर कलाकारांच्या एकाग्रतेचे दर्शन होते.

*अजिंठ्याच्या क्र. २६ च्या लेण्यात म्हटले आहे की,

“जो पर्यंत विहार चैत्यासारखे पुण्यकृत्य या जगात विद्यमान आहे तोपर्यंत ते करणारा मनुष्य स्वर्ग लोकात आनंदाने राहतो.म्हणून पर्वतांमध्ये यावद्च्चंद्रदिवाकरौ टिकणारी लेणी कोरवावी.”

कोठून आले हे लोक..? आपलेच तर होते येथीलच याच मातीतले…!

म्हणजे आपल्यापैकीच कुणाचे तरी पुर्वज.म्हणजे आम्ही तेव्हाही कमी नव्हतोच व आताही नाहीच फक्त पुढिल काळात परकीय सत्तांनी आपली मुस्कटदाबी केली हि मोठी शोकांतीका आहे व ती न भरुन येणारी ठसठसती जखम देखील आहे.पण,बरेच जण यांचे संवर्धन, संगोपन न करता.कुठे नाव कोरणे,चुन्याने नावे टाकणे, कुठे दगडच मारणे असे महाप्रताप करताना दिसतात.अशा सुंदर कलाकृती उभारणार्या हातांचा हा अपमान आहे पर्यायाने तो आपल्या उदात्त संस्कृतिचाही अपमान आहे याची काळजी आपण घ्यायला हवी.हळूहळू चित्र बदलत आहे सर्वसामान्यांचीही पाऊले आता या धर्मक्षेत्रांकडे वळू लागलेली आहेत.स्थानिक संघटनांच्या व पुरातत्व खात्याच्या सहभागाने लेण्या, गडकिल्ले यांचे संवर्धन होताना दिसते आहे ही देखील अत्यंत सुखद बाब आहे.

धन्यवाद..!

संदर्भ-
*सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख
-वा. वि. मिराशी
*भारतीय मूर्तीशास्त्र-नि. पू. जोशी.
*सातवाहनकालीन महाराष्ट्र-वा. वी. मिराशी
*प्राचीन भारतीय कला-श्री. म. माटे
*भारतीय वास्तुशास्त्र-पू. र. कुलकर्णी
*सह्याद्री-स. आ. जोगळेकर

-नवनाथ आहेर


पितळखोरा लेणीचे शिल्प दगड कोसळल्यामुळे भग्न झाले आहे. तुटलेल्या शिल्पाचे अवशेष वेरूळ येथे सुरक्षित आहेत, असे केंद्रीय पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले.पितळखोरा लेणीच्या दर्शनी भागातील द्वारपालाचे शिल्प बेपत्ता झाल्याबाबत अभ्यासकांना शंका आली. या लेणीचे १९९५, २००१ आणि २०१५ या वर्षीचे छायाचित्रे तपासली असता महत्त्वाचे शिल्प नामशेष झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित शिल्प कुणी कापले किंवा तोडफोड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे; मात्र या लेणीवर २००९मध्ये बाजूच्या डोंगरावरील मोठा दगड कोसळला होता. या दगडाच्या आघाताने शिल्प फुटले' असे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी एम. के. सिंग यांनी स्पष्ट केले. या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष त्र्यंबके होते. समितीने शिल्पाचे अवशेष गोळा करून वेरूळ येथे पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात ठेवले. अजूनही अवशेष तिथेच असून जाणीवपूर्वक शिल्पाची तोडफोड केली किंवा चोरीची घटना घडली नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. दख्खनचे पठार बेसॉल्ट खडकापासून तयार झाले आहे. हा दगड अतिशय कठीण असतो. पितळखोरा लेणी बेसॉल्टमध्ये घडली आहे. हा दगड कठीण असला तरी झीज सुरू झाल्यानंतर अतिशय वेगात होते. या कारणामुळे लेणीचा भाग फुटला असे केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक एम. एस. चौहान यांनी सांगितले. लेणीच्या संरक्षणासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. तरीसुद्धा लेणीचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे चौहान यांनी सांगितले.''बेसॉल्ट खडकाची झीज झाल्यामुळे लेणीतील शिल्पाकृती खराब झाल्या आहेत. काही शिल्पांवर दगड पडले आहेत. औरंगाबाद लेणीतही परिस्थिती आहे; मात्र शिल्प काढून नेल्याची शक्यता नाही.'' 

   पितळखोरा लेण्यांचा समूह

पितळखोरा हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात येते या गावाचे प्राचीन नाव हे पितंगल्य आहे या गावातील डोंगरात दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन गुंफा मानल्या जातात इथे बौद्ध धम्माच्या तेरा लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांपैकी दरीच्या निमुळत्या भागात नऊ लेण्या तर दुसऱ्या बाजूला चार अश्या तेरा लेण्यांचा समूह आहे हि लेणी दक्षिण भारताच्या सातमाळा पर्वत रांगेत कोरलेल्या आहेत व औरंगाबाद  दक्षिण बाजूला ७८ किमी वर तर कन्नड पासून १७ किमी अजिंठा पासून एकरेषीय अंतरावर ८० किमी वर आहेत तर वेरुळच्या वायव्य दिशेला ३७ किमी आहेत चाळीसगाव पासून दक्षिण बाजूस हि लेणी ३२ किमी अंतरावर आपणास पाहायला मिळतात
या लेण्यांची निर्मिती सातवाहन काळात करण्यात आली आहेत इ स पूर्व दुसऱ्या शतकात हि लेणी कोरलेली आहेत यात दोन भागात लेण्यांची विभागणी केली जाते एक ते नऊ लेण्यांचा समूह व दहा ते तेरा लेण्यांचा समूह यामध्ये आपणास तीन , दहा, १२, व तर हे चैत्य आहेत लेणी १,२,४,५,६,७,८,९ हे विहार आहेत तर लेणी ११ हि स्तुपांची गॅलरी आहे व चार न्माबर हे मुख्य विहार आहे तर ३ नंबर ची लेणी हि मुख्य चैत्य आहे. येथील सर्व लेणी एकाच काळातील नाहीत लेणी १ हे इसवी सन दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेली आहेत तर २,३मं  व पाच हि लेणी दुसऱ्या शतकाच्या काळातच कोरलेली आहेत बाकीच्या लेण्यांचा काळ हा इसवी सन पूर्व पहिले शतक आहे हि दक्षिण भारताची आद्य लेणी ठरतात याची माहिती व   यांचा शोध १८५३ मध्ये लागला असून पाश्चात्य संशोधक जेम्स विल्सन यांनी जर्नल ऑफरॉयल एशियाटिक सोसायटी च्या क्रमांक ४ मध्ये यांचा प्रथम उल्लेख केलेला आपणास सापडतो पुढे जेम्स फर्ग्युसन व जेम्स बर्जेस यांनी इ स १८८० मध्ये प्रकाशित केलेला त्यांचा केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया या ग्रंथात १ ते ९ लेण्यांची माहिती दिलेली आहे लेणी १० व ११ चा शोध १९४१ मध्ये म गो दीक्षित यांनी लावला तर लेणी १२ व तेरा चा शोध १९५३ ते ५५ च्या आसपास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने लावला व या लेण्यांना याच काळात राष्ट्राइय संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले
लेण्यांची सविस्तर महिरती  पाहू या
लेणी क्रमांक १: हि विहार लेणी असून या लेणीची साड्या पडझड झाल्यामुळे तिचे केवळ भग्नावशेष शिल्लक राहिलेले आहेत  या लेणीत भिख्खुगृहांचे भग्न अवशेष भिख्खूंच्या निवासासाठी कोरलेली शयनासन व लाकडी दरवाजा बसवण्यासाठी केलेल्या खोबण्या आहेत या अवशेषांवरून या ठिकाणी दोन पेक्षा   अधिक विहार कोरलेले असावे दक्षिण बाजूस एका विहारातील पाठीमागील दोन व उजवीकडे तीन भिख्खू गृह भग्नावस्थेत आहेत या भिख्खू गृहात कोरीवकाम आढळते या लेणीचा  दगड लाल असून प्रस्तरजन्य वालुकामय ठिसूळ खडक निघाल्याने स्थापत्य  कलाकरांना लेणीचे खोदकाम अर्धवट सोडून द्यावे लागले आहे

लेणी क्रमांक २ : हि लेणी देखील १ नंबर च्या लेण्या सारखीच भग्न अवस्थेत आहेत या लेण्यांकडे जाण्यासाठी  अकरा पायऱ्यांचा जिना कोरलेला आहे   आणि हि विहार लेणी आहेत लेण्याच्या उजव्या बाजूस चार भिख्खू गृहात दोन उंच आसन व एल लांब आसन कोरलेले आहे लेण्यातील पाणी बाहेर जाण्यासाठी एक मोरी कोरलेली आहे व त्यावर झाकण्यासाठी शिलाखंडाचा वापर केलेला आहे लेणी ३मध्ये  पाणी जाऊ नये म्हणून  या मोरीच्या उपयोग  केलेला असावा २ ३ ४ याना एकत्रित ओसरीवजा  भाग आहे त्यामुळे यांचा काळ एकच असावा २ व ३ मधील दुभाजक भिंत मात्र ठिसूळ खडकामुळे पडलेली आहे

लेणी क्रमांक ३ : हि लेणी हीनयान काळातील चैत्य आहे. याच लेणीत महायान कालीन चित्रकाम आढळून येते या लेण्याला महायान लनी असे हि म्हटले  जाते म्हणजे काय तर हि लेणी महायान काळातील कलेच्या अस्तित्वाचे एकत्रितपणे दर्शन घडवून आणते
अजिंठा लेणी क्रमांक दहा व पितळखोरा येथील हि चैत्य लेणी यांच्या विलक्षण साम्य आहे हि चैत्य इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात कोरलेली असावीत या लेणीची लांबी २५.८ मित्र तर रुंदी १०.७ मित्र असून तिची पृष्ठ भागापासून उंची ९ मित्र आहे त्यामध्ये ४.३ मित्र उंचीचे ३७ अष्टकोनी स्तंभ होते त्यापैकी आता फक्त १२ पूर्वस्थिती मध्ये आहेत येथील स्तंभ हे भाजे येथील चैत्य लेणी व अजिंठा येथील लेणी क्रमांक १० मधील स्तंभाप्रमाणे घसरत्या कलाने कोरलेले आढळतात या लेणीस दान दिल्या संबंधीचे शिलालेख दोन स्तंभावर आढळतात ते इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहेत स्तंभावर चित्रकाम केल्याचे अवशेष आढळतात स्तंभामुळे या लेण्यांचे मध्य मंडप दोन्ही बाजूला १.४ मीटर रुंद नासिका व मागील अर्धवर्तुळाकार भाग असे  तीन भाग पडतात  नासिकांना अर्ध कमानी द्वारयुक्त दगडी गोपान कोरलेले आहे लेणीचे छत गज पृष्ठाकृती असून मंडपाखाली लाकडी गोपान बसविल्याच्या खाणाखुणा आपल्याला दिसतात दोन लगडी गोपानातील चौरस कृती भागात केलेल्या चित्रकाम मध्ये कमळाच्या रूपकाचे चित्रकाम केल्याचे आढळते या लेणीचा दर्शनी भाग पडलेले आहेत तो सुंदर शिल्पांनी सजवलेला असावा या लेण्यातील स्तंभावर गौतम बुद्ध बोधिसत्व आणि भिक्खू इत्यादी विषय चित्र आहेत एक कमल पुष्पावर अभय मुद्रेत असणरी बुद्ध प्रतिमा आहे या लेणीत समाज जीवन व बुद्धाच्या जीवनातील घडलेले महत्वाच्या घटना व प्रसंग चित्रित केले असावीत परंतु ती चित्रे आता नष्ट झालेली असावीत हे चित्रकाम इसवी सणाच्या पाचव्या सहाव्या शतकातील असावे
या लेणीत १०.८ मित्र व्यासाचा अंशतः बांधलेला व अंशतः कोरलेल्या स्वरूपाचा मोठा स्तूप होता हा स्तूप नष्ट झाला असून आज केवळ स्तूपाच्या अंडाच्या खालील भाग शिल्लाख आहे स्तूपाच्या मागील बाजूस पाच खोबण्या कोरलेल्या आहेत त्या खोबाण्याचे अवशेष पात्रात पवित्र अवशेष मौल्यवान स्पटिक आणि भिक्षु च्या  अस्थींचे अवशेष ठेवण्यात येत असत या खोबन्यांची माहिती अशी
पहिली खोबणी ६ इंच लांब चार इंच रुंद व पाच इंच खोल असून त्यावर झाकणी आहे .
दुसरी खोबणी दोन इंच लांब दोन इंच रुंद व अडीच इंच खोल आहे तिच्यावर रिंगसारखी वस्तू बसवण्यात आलेली आहे हि खोबणी अधिष्टानाच्या पायापासून साडेसह इंच उंच कोरलेली आहे
तिसरी खोबणी दुसऱ्या खोबणी पासून दोन फुत्सह इंच अंतरावर आहे हि खोबणी तीनिनच लांब चार इंच रुंद व सात इंच खिल आहे या खोबणीत स्तूपाच्या आकाराचे अवशेष पात्र ठेवण्यात आले आहे
चौथी खोबणी एक फुट उंचीवर असून तिची लांबी दोन इंच रुंदी तीन इंच व खोली साडेतीन इंच आहे या खोबणीत हि स्तूपाच्या आकाराचे दोन अवशेष पात्र  होते
पाचवी खोबणी १ फुट १ इंच लांब साडेचार इंच रुंद व अडीच इंच खोल आहे तिच्यावर शिलाखंड झाकलेला आहे
या लेणीत प्रवेश करण्यासाठी अकरा पायऱ्या कोरलेल्या आहेत पायऱ्यांच्या खाली दोन्ही बाजूस यक्ष शिल्प आहेत सर्वप्रथम पंखधारी अश्व कोरलेली आहेत आणि त्यावर दोन भारवाहक यक्ष कोरलेले आहेत एकी यक्ष मोठा आहे तर एक लहान आहे आकाराने मोठ्या असणाऱ्या यक्षाचे तोंड बंद असून लहान असणाऱ्या यक्षाचे तोंड उघडे आहे  नाशिक येथील लेणी क्रमांक तीन मधील यक्षाचे शिल्प असेच आहे
पायऱ्यांच्या खाली भागात शिल्प बसवण्यासाठी गोलाकार खोबण्या कोरलेल्या आढळतात तसेच समोरील दोन अर्ध स्तंभाचे अवशेष आपणास पाहायला मिळतात
लेणी क्रमांक ४ : हि विहार लेणी आहेत लेण्यांचा दर्शनी भाग हा सुंदर शिल्प कोरलेली आहेत पण ठिसूळ दगडामुळे हा भाग नष्ट झाला आहे केवळ चैत्यगवाक्ष व काही शिल्पाचे अवशेष शिल्लक आहेत दर्शनी भागात चार चैत्य गवाक्ष एकाच रांगेत कोरलेली आहेत आणि त्याच्या आत वेदिका पट्टीचे आणि प्राण्यांचे अंकन आपणास पाहायला मिळते अर्धगोलाकृती वेदिका पट्टी वर लहान चैत्य गवाक्षांचे शिल्पांकन केले आहेत तर पत्तीखाली एक मिथुन शिल्प हि कोरलेल आहे लेणीच्या समोर भग्न झालेली गज मालिका आहे व दोन द्वारपाल यक्ष प्रवेशद्वारावर शिल्पांकन केले आहे हि लेणी ५२ फुट असून ती वरून येथील तीन माजली लेणी व दशावतार लेणी प्रमाणे एकरेषीय रांगेत सज्जात विभागली आहेत या लेण्यातील स्तंभ खालच्या  बाजूस व वरच्या बाजूस चौरसाकृती असून त्याचे काठ तासलेले आहेत तसेच हे स्तंभ सज्जाच्या पलीकडे निमुळते गुळगुळीत उन्नत लगिना छताना पेललेले आहेत लेणी पाठोपाठ भिक्खू च्या निवासासाठी कोरलेली सात भिक्खू गृहापैकी पाच गृहाना जाळीदार खिडक्या आहेत त्यांच्या खिडकी व दरवाजाला चैत्याकृती कमानी आहेत बेडसा व अजिंठा लेणी क्रमांक १२  या विहार लेण्याप्रमाणे पितळखोरा लेणीतील भिक्खू गृह चैत्य कामानीने शिल्पांकन केलेलं आहे दुसऱ्या व तिसऱ्या भिक्खू गृहात प्रत्येकी दोन अष्टकोनी अर्ध स्तंभ आहेत बाकीच्या प्रत्येक भिक्षु गृहात प्रत्येक अष्टकोनी अर्ध स्तंभावर प्राणीशीर्ष कोरलेली आहेत स्तंभ शीर्ष घंटाकार असुणु प्राणी शीर्ष चार एकेकावर एक  वाढवनार्या चौकोनी थरावर आधारलेले आहेत . स्तंभ शिर्षावरील कोरलेले प्राणी बसलेल्या अवस्थेत असून एका प्राणी शिर्षाच्या जोडीचा अपवाद वगळता सर्व प्राणी पंखधारी आहेत सहाव्या आणि सातव्या भिक्खू गृहातील स्तंभावर उंटाची मान व मांजराचे शरीर आणि पंजे कोरलेले असून मांजराला पंख आहेत पहिल्या पूर्व भिक्खू  गृहात अर्ध स्तंभावर कोल्हा दुसऱ्या व तिसऱ्या भिक्खू गृहातील स्तंभावर पंखधारी हरीण तिसऱ्या चौथ्या भिक्खू गृहातील अर्ध स्तंभावर घोडा तर चौथ्या व पाचव्या भिक्खू गृहातील अर्धा स्तंभावर घायाळ  सिंह आहे तसेच लेणीवर डावीकडे पंखधारी उभयलिंगी शिल्प कोरलेले आहे अशी उभयलिंगी शिल्प सांची च्या प्रवेश द्वारातील तोरणात आढळतात अजिंठा लेणी क्रमांक १६ व १७ च्या चैत्य कमानीवर अर्ध गोलाकृती भागावर हत्ती सिंह मगर व घोडा प्राण्यांची शिल्प आढळतात तर नाशिक च्या चैत्य लेण्याच्या कमानीवर हि अशी शिल्प आढळतात डाव्या बाजूने क्रम धरल्यास पाचव्या व सहाव्या भिक्खू गृहाना प्रत्येकी दोन निद्रासने कोरलेली आढळतात तर सातव्या भिक्खू गृहात निद्रासन कोरलेले आढळत नाही भिक्खू गृहाचे चत चैत्य लेण्या प्रमाणे फासळ्या युक्त आहे
लेण्यात पाणी येवून तिचे आयुष्य कमी होवू नये म्हणून स्थापत्य कलाकारांनी एका छिद्र द्वारे पाणी लेनिबाहेर काढण्याची योजना केलेली आहेत या लेणीचे सर्व विधानाचे जोते नऊ भव्य हत्तीच्या गज मालिकेवर बसलेले आहे त्यामुळे लेनिनचे इझ्जे हे हत्ती पेलत असल्याचा भास होत आहे परंतु आज हे सर्व हत्ती नष्ट झालेले असून  त्यांचे अवशेष शीर व धड बाजूंला पडलेले आहेत हे अतंत्य वाईट अवस्थेत आहेत हत्तींवर आरूढ झालेल्या महुताचे शिल्प हि होते हि गज मालिकेची शिल्पे धौली येथील मौर्यकालीन गज शिल्पाशी सामान्य सांगणारी आहेत या लेणीचे गज मालिके जवळ प्रवेशावर १. ६ मित्र लांब व ७५ मित्र रुंद  आहे  हे प्रवेशद्वार अर्ध कमळ पुष्पाणि शिल्पांकित केले आहे नाशिकच्या चैत्य लेणींचे प्रवेशद्वार असेच सजविले आहे द्वार शाखा म्हणजे प्रवेश द्वारचा दोन्ही बाजूस दरवाजा बसवनिण्यासाठी खोबण्या आहेत प्रवेश द्वाराच्या दोन्ही बाजूस डोक्यावर शुंग काळातील उष्णीय व धोतराच्या आकाराचे अधोवस्त्र घातलेले आणि उठावरदार व्यक्तिमत्व द्वारपाल यक्ष आहेत त्यांच्या हातात लांबट ढाल व भाला हि शस्त्रे आहेत उजव्या द्वारपालाने हातात तर डाव्या द्वार पाल ने  डाव्या हातात भाला पकडला आहे ढालीस गोंडे आणि घंटा लावून सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो  प्रत्येक द्वारपालाच्या वर हत्ती एका बाजूस उभ्या असलेल्या स्थितीत कोरलेले आहेत

डाव्या हत्तीच्या वरती किन्नराचे भग्न अवशेषातील शिल्प आहे द्वारपाल व हत्ती यांच्यात लांबट जागेत गजलक्ष्मी म्हणजे महामाया चे चिन्ह आहे कमलावर बसलेल्या समभागात कटी वस्त्र महामायेचे शिल्प आहे दोन्ही बाजूस हत्ती महामायेस स्नान घालत आहेत द्वारपालाच्या डाव्या बाजूस फनायुक्त नाग कोरलेला असून लेणीत येणारे पावसाचे पाणी पाषाणात एका नलिका करून ते नाग्फाण्याच्या छिद्रातून करंज्या प्रमाणे बाहेर सोडलेले आहे गज शिल्पाच्या रांगेत गज शिल्पाच्या उजव्या बाजूस घोड्याचे शिल्प असून त्याच्या पुढे पुरुष व बाजूंला चवरी धारीकांचे शिल्प आहे त्याच्या असलेला शिलालेख नष्ट झालेला आहे या शिल्पात घोडा आणि याच लेणीच्या परिसरात उत्खननात मिळालेला महाभिनिष्क्रमण शिल्प पटात घोडा यांच्यात एकरूपता दिसते हि लेणी अतंत्य सुंदर आहेत
लेणी क्रमांक ५ : हि लेणी विहार लेणी आहेत  त्याच्या बाजूस पाच पाच व मागील बाजूस दोन व पुढील भागात अतिरिक्त दिन अशी एकूण 14 भिक्खू गृह आहेत या भिक्खू गृहातील मागील बाजूस किंवा लगतच आसने कोरलेली आहेत मागील बाजूस असलेल्या भिक्खू गृहापैकी दोन मध्याभागी व दोन त्याच्या मागे कोरलेली आहेत या लेणीत पाठीमागील  बाजूस लहान चापाकृती भिक्खू गृह कोरलेल असून त्याचा एक भाग बांधीव  स्वरूपाचा होता त्यामुळे सुरुवातीला हि लेणी चैत्य गृह असावे आणि त्याच्या बदलेला चैत्य चापाकृती असावा असे वाटते या भिक्खू गृहाच्या प्रवेशानाजिक च एका बाजूस एक लहान आसने कोरलेली आहेत तर प्रवेश साठी असलेल्या दोन पायऱ्या पैकी शेवटची पायरी अर्धा गोलाकार असून लेणी समोर एक लहान ओसरी आहे लेणीत प्रवेश करण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आहेत तसेच चौरसा कृत पायऱ्यावर खोबण्या कोरलेल्या आहेत लेणीच्या अगदी समोर एक मोठा शिलाखंड पडलेला आहे त्यावर ब्राह्मी लिपी तील एक प्राकृत भाषेतील य अस्थीसेनिय हा अपूर्ण शिलालेख कोरलेला आहे या लेखाचा काळ इसवी सन पूर्व दुसर शतक असल्याचे मानले जाते या लेखावरून व्यापारी संघाने दान केल्याची माहिती होते
लेणी क्रमांक ६ हि लेणी विहार लेणी असून यामध्ये पंधरा भिक्खू गृह आहेत प्रत्येक भिक्खू गृहाला पायऱ्या कोरल्या असून भिक्खू गृहाच्या भिंतीवर कोनाडे कोरलेले आढळतात पाठीमागील भिक्खू ग गृहाच्या  मागील बाजूस असलेया भिंतीवर दगडी तुलई वर कोरीव हस्त आकृती कलात्मक आहेत या विहाराच्या प्रवेश द्वाराजवळ अगदी खालच्या बाजूस लहान व्हरांडा आहे या व्हरांड्याच्या बाजूंला भाजलेल्या विटांनी बांधली आहेत विहाराचे चत व भिंती वरील प्लास्टर आणि रंगकामाचे  काही अवशेष नजरेश पडतात


चाळीसगाव व कन्नड तालुक्यांच्या मधील गौताळा औट्रम घाटातील पितळ खोरे गाव असुन, तेथील लेणी ही पितळ खोरा लेणी म्हणून ओळखली जातात. ही लेणी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड पासुन २० की.मी. , तालुक्यातील पितळ खोरा गावी आहेत.

या शिल्प कलाकृतींचा प्राचीन इतिहास बघितला तर लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्यद्रीची ! याच सह्यद्रीच्या उदरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला उत्तम पाश्र्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिक, इत्यादिंनी दानं दिल्यामुळे महाराष्ट्रात बौद्ध, हिंदु व जैन धर्मीयांच्या लेणींची निर्मिती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते.

पितळखोरा लेणी

या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यात काही गुहा दुमजली आहेत. वर ती जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत.

पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा - वेरूळची येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते.

राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली असावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये "शकरीन" हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसऱ्या भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली. हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत.

या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्त्व प्राप्त करून घेतले आहे.

उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच आणि ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.

पितळखोरा लेणीस संवर्धनाची अत्यंत आवश्यकता असून पितळखोरा येथील प्राचीन बौद्ध लेणीची माहिती आपल्याकडील लोकांना अनेक वर्षांपासून आहे. पुरातत्त्वविषयक ग्रंथांतून अनेकवेळा सविस्तर विवेचन झालेले आहे; परंतु येथील शिल्पांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी अजुन पर्यंत करता आली नाही असे वाटते !.

स्रोत :-

पितळखोरा बुद्ध  लेणी 













एक अर्धविकसित तथा सद्या दुर्लक्षित असलेली लेणी समूह । । । ।
आज औरंगाबाद जिल्ह्यातील पितळखोरा बुद्ध  लेणी बघण्याच्या योग आला.अतिशय निसर्गरम्य अश्या वातावरणात ही लेणी आहे. पावसाळ्यात ह्या लेणीला भेट देणे थोडे जिकारीचे आहे. कारण ह्या लेणीला जाण्यासाठी एका छोट्या वेगवान पाण्याच्या ओढ्याला पार करून जावं लागते.
पितळखोरे लेणी हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे. हा लेणीसमूह शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.पितळखोरे लेणी भारतातील सर्वात जुनी लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी सुमारे इसपूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळची लेणी येथील लेण्यां पेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते.
     या लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत व वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्याची चित्रे आहेत.       भोवतालच्या दालनातील छतावर सिंहासनाधिष्ठीत आणि वर छत्र असलेल्या बुद्ध मूर्तीनी चितारलेले, सजवलेले आहे. मुंडन केलली मुले व बुटक्या मूर्ती गुढघे टेकून वंदन करताना दिसतात. स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात. (या चित्रांचा काल गुहेपेक्षा अर्वाचीन दिसतो.) चैत्य लेणे क्र.३ आणि विहार लेणे क्र. ४ यांच्या दर्शनीय भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत. विहार लेणे क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तू शिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकार युक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूना घंटा लोंबताना दिसतात. या लेण्याच्या प्रवेश द्वारावरील द्वारपाल लक्षणीय आहेत. या लेण्यातील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय. या राजदंपतीने भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळेच महत्व प्राप्त करून घेतले आहे.
पितळखोरा लेणी ला जाणे थोडे जिकारीचे आहे।। संपूर्ण जंगलमय परिसर आहे।। मनुष्यवस्तीपासून खूप दूर आहे।।एका छोट्या वेगवान ओढ्याला पार करून जावे लागते। इथे पर्यटकांचा बिलकुल वावर नसतो।केवळ एक सुरक्षा रक्षक असतो।।आम्ही भेट दिली तेव्हा आम्हा तीन भन्ते व्यतिरिक्त कुणीच नव्हते।।जाताना ग्रुप करून जाणे जास्त सोयीचे होईल
- ऐतिहासिक वारसा असलेल्या पितळखोरा लेणींचे नैसर्गिक आपत्तीमुळे अतोनात नुकसान होत असून लेणी नामशेष।   होण्याच्या मार्गावर आहेत. पुरातत्त्व विभाग, वन विभाग व पर्यटन विभाग यांच्या दुर्लक्षाने लेणीची दुरवस्था झाली असून शासनाने याकडे लक्ष देऊन लेणीचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे।
कन्नडपासून 20 किलोमीटर अंतरावरील डोंगरात पितळखोरा लेणी आहे. येथील लेणी इसवी सन पूर्व पहिल्या, दुस-या व तिस-या शतकात कोरल्या गेल्या आहेत. अजिंठा व वेरूळ लेणींच्याही पूर्वीची पितळखोरा लेणी असल्याचे इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. लेणी क्र. एक ते नऊ मधील बराचसा भाग शेवटची घटका मोजत आहे.
पुरातत्त्व विभागाने पुढाकार घ्यावा
- महाराष्ट्रातील अत्यंत प्राचीन लेणींमध्ये पितळखो-यातील चैत्यगृहाची गणना होते. चैत्यगृहात पुरातन चित्रकलेचे अनेक अवशेष आहेत; परंतु अशा अद्भुत कलेच्या वस्तुस्थितीची  माहिती जागतिक पातळीवर होण्यासाठी पुरातत्त्व विभागाने पुढाकार घ्यावा.
पितळखोरा लेणी संवर्धनाची गरज । । ।
पितळखोरा लेणीस संवर्धनाची अत्यंत आवश्यकता असून पितळखोरा येथील प्राचीन बौद्ध लेणीची माहिती आपल्याकडील लोकांना अनेक वर्षांपासून आहे. पुरातत्त्वविषयक ग्रंथांतून अनेकवेळा सविस्तर विवेचन झालेले आहे; परंतु येथील शिल्पांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणे अजूनही शक्य आहे.
पितळखोरा लेणी

औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर औरंगाबादपासून कन्नड हे अंतर ६० कि.मी. आणि त्यापुढे पितळखोरा २० कि.मी. भरते. अत्यंत सुंदर आणि प्राचीन बौद्ध लेणी पाहायला पितळखोरा या ठिकाणी गेलेच पाहिजे. हे जागतिक वारसास्थळ म्हणून युनेस्कोने संरक्षित केलेले आहे. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकामध्ये खोदलेली हीनयान पंथाची ही लेणी आणि तो सगळा परिसरच अत्यंत नयनरम्य आहे. गौताळा अभयारण्यात हा भाग येतो. लेण्यांमध्ये जाण्यासाठी उत्तम बांधलेल्या पायऱ्या आहेत. १४ लेण्यांचा हा समूह असून त्यातील चार चैत्यगृहे आहेत. त्यातील खांबांवर अत्यंत सुंदर रंगवलेली चित्रे आजही शाबूत आहेत. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली ती चित्रे खांबांचे आकार आणि खोदीव स्थापत्य पाहून आश्चर्याने बोटे तोंडात जातात. डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून दगडी पन्हाळीचा केलेला वापर आणि ते पाणी थेट खालीपर्यंत नेऊन सोडायची तत्कालीन स्थपतींची दूरदृष्टी केवळ वाखाणण्याजोगी आहे. या लेण्यांच्या समोरील डोंगरामध्ये पण काही खोदीव गुहा असून त्यामध्ये स्तूप आहेत. कदाचित ते कोणाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेले असावेत.
काल एका धम्म भगिनी ने मला ""लेणी म्हणजे काय"" असं प्रश्न केला।ह्याचे पण स्पष्टीकरण व्हायला पाहिजे।।लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासा–भिक्खूंना तपस्या-साधना-विश्रांती करण्यासाठी केला जाई. लेणी ही प्रामुख्याने सातवाहन, वाकाटक व राष्ट्रकूट या राजवंशाच्या काळात कोरली गेली. अशा वैशिष्ट्यपूर्ण लेण्यांमध्ये महाराष्ट्रातील अजिंठा, कार्ले, कान्हेरी, घारापुरी, पितळखोरे, भाजे, वेरूळ ही जगप्रसिद्ध लेणी आहेत.
लेण्यांमध्ये चैत्यगृहे, विहार व मंदिर यांचा समावेश आहे. प्रारंभी या लेणी अनलंकृत असाव्यात; परंतु पुढे त्यामधे शिल्पे व मूर्ती खोदण्यात आल्या. तसेच लेण्यांतील भिंतीवर चित्रे कोरून त्या सुशोभित करण्यात आल्या. लेण्यांना शैलगृहे, शिलामंदिरे असेही म्हणतात. लेण हा शब्द संस्कृत लयन- गृह या शब्दावरून आला असावा.
लेण्याच्या माहितीबाबत एक ढोबळमानाने असलेली गोष्ट अशी की, पुरातन काली बौद्ध भिक्खु हे धम्म प्रसारार्थ भारतभर फिरत असत. त्यांचे दिनचर्येचे पाळायचे नियम कडक असत. ते नियम पाळणे सुलभ व्हावे आणि धम्मप्रसारार्थ फिरणार्‍या भिक्खुंची ध्यानधारणेची सोय सहज व्हावी ह्यासाठी अशी लेणी खोदून घेतली. अशी लेणी लेण्याद्री, जुन्नर परिसर, कार्ले, भाजे, नाशिक येथे पाहण्यास मिळतात. बहुतेक प्रत्येक लेण्यात, ते लेणे ज्याने खोदविले त्याच्या नावाचा उल्लेख सापडतो.
सबंध भारतात आज माहिती असलेली सुमारे एक हजार लेणी असून त्यापैकी शंभर लेणी ही ब्राह्मणी म्हणजे वैदिक व जैन आहेत. उरलेली ९०० ही बौद्धांची आहेत असे मानले जाते. सातवाहन काल व त्यानंतर परदेशी व्यापार्‍यांशी होणार्‍या व्यापारामुळे आलेली भरभराट ही या लेण्यांच्या निर्मितीला मदत करणारी ठरली असे मानले जाते
  इतिहास प्रेमी विशेषतः लेणी प्रेमींनी ह्या लेणीला  अवश्य भेट द्यावी....

भन्ते धम्मानंद , मोबा.9511964256

Pitalkhora caves:

These are Hinayan period 14 rock-cut caves dated back to the 3rd century. Most of the carvings on the face of caves has been fall away due to antiquity . Out of these caves some are chaityas and remaining vihars.
You can also locate Buddha paintings on the inner walls and pillers of a chaitya. Currently, there is restoration work is going on for these caves.


Whole cliff fallen on the ground; all the carvings on the face of cave vanished.




Chaitya



Paintings





Vihar's













Some incomplete caves



पितळखोरा लेण्यांची महिती-

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील सातमाळा डोंगररांगेत असलेला एकूण १८ लेण्यांचा समूह म्हणजेच पितळखोरा लेण्या. औरंगाबाद पासून ८० किमी आणि चाळीसगाव पासून ३० किमी अंतरावर या लेण्या आहेत . बौद्ध वास्तुकलेचा उत्कृस्ट नमुना म्हणजे पितळखोरा लेण्या. या लेण्यांचे बांधकाम दुसऱ्या शतकात झालेले  असावे असे अभ्यासातून दिसून येते. 

सध्या खान्देशातील चांदोरा टेकडीवर हा लेण्यांचा समूह दिसून येतो. या लेण्या बघत असतांना घेतलेली मेहनत आणि त्याकाळात असलेली कलाकृती लगेच जाणवू लागते. 

या गुहा २ भागात विभागल्या आहेत.पहिल्या भागात १४ चा समूह  आणि दुसऱ्या भागात ४. 

४ चैत्य लेण्या आणि बाकीचे विहार आहेत. सगळ्या लेण्या हिनयना काळातील आहेत आणि उरलेल्या पैंटिंग ६व्या शतकातील महायानां काळातील आहेत. 

सगळ्यात महत्वाची लेणी क्रमांक ३ जी चैत्य गृह म्हणून ओळखली जाते. चैत्यगृहात गुफेच्या दोन्ही बाजूने गोल स्तूप आहेत. या स्तूपांवर अजिंठ्या लेण्यांवर करण्यात आलेल्या पैंटिंग सारखे चित्र आहेत. यातील बरीचशी चित्र हि भगवान गौतम बुद्धाची उभी आणि बसलेल्या स्वरूपातील असून ती अजूनही ठळक स्वरूपात दिसून येतात. 

विहारांमध्ये प्राचीन काळातील सभागृह पद्धत आहेत जिथे गृहाच्या मध्यभागी लहान बैठक व्यवस्था केलेली दिसते. 

लेणी क्रमांक ४ हि खूप सुंदर अजून त्यात जणांसाठी पायर्यांचा चढता मार्ग असून सुरुवातील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन दगडात कोरलेले भले मोठे द्वारपाल दिसून येतात. त्यांचा पेहराव पाहता शाका संस्कृती दिसून येते. प्रवेशद्वाराच्या भिंतीला लागून त्यात दगडावर कोब्रा जातीचे साप कोरलेले आहेत. 

विहाराच्या मध्ये गेल्यावर ९ हत्ती कोरलेले दिसून येतात आणि शेवटी अर्धअश्व स्वरूपातील माणसाची प्रतिकृती दिसून येते ज्यास चौरी असे म्हणतात. समोरच यक्ष प्रतिकृती दिसून येते. 

येथे असलेले दोन शिल्प ( यक्ष आणि गजलक्ष्मी ) मुंबई मध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. 

मुंबई वरून पितळखोरा यायचे असल्यास ३६५ किमी अंतर आहेत.


पितळखोरा लेणी

पितळखोरा लेणि
पाटणा देवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली आसावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत.
उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.



Pitalkhora caves:

These are Hinayan period 14 rock-cut caves dated back to the 3rd century. Most of the carvings on the face of caves has been fall away due to antiquity . Out of these caves some are chaityas and remaining vihars.
You can also locate Buddha paintings on the inner walls and pillers of a chaitya. Currently, there is restoration work is going on for these caves.

Whole cliff fallen on the ground; all the carvings on the face of cave vanished.



Chaitya


Paintings




Vihar's
Some incomplete caves

पितळखोरे लेणी- महाराष्ट्रातील प्राचीन अविष्कार*


लयनम्  हा संस्कृत शब्द, यालाच प्राकृत मध्ये लेणं व मराठीत लेणी आणि या लेण्याना  वर्षावास असेही म्हणतात . ध्यान साधना व विविध कार्यासाठी पावसात सुरक्षित राहता यावे यासाठी पर्वतात ही शैलगृह खोदली गेली .प्राचीन काळी सर्वात सुरक्षित असा आदिवास म्हणून अशा प्रकारची शैलगृहे ही संकल्पना समोर आली. तथागत गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांच्या अनुयायांनी वेळोवेळी धर्मपरिषदा बोलावल्या अशी परिषद मगधचा राजा अजातशत्रू याने वेभार डोंगररांगेतील सतपर्णी या गुहेत भरविली .अशा गिरिकंदातील एकांत, सुंदर ,शांत ठिकाणे बौद्ध भिक्षुना सोयिस्कर ठरतील या भावनेने गुहा शिल्पाच्या निर्मितीला सुरवात झाली .हा कालखंड इस पूर्व ४९१ ते ४५९ हा आहे म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षा अगोदर ह्या शैलगृहाच्या निर्मितीस सुरुवात झाली. सम्राट अशोकाच्या काळात लेणी निर्मितीचा प्रथम प्रयत्न झाला त्याचा नातू दशरथ यांनी आजीवक पंथाच्या उपासकांसाठी दक्षिण बिहार मधील बारबर या ठिकाणी लेणी खोदली हा उल्लेख तेथील शिलालेखात आढळतो. नागार्जुन , सीतामढी येथे सुद्धा इस. पूर्व 252 ते 200 या कालखंडात लेण्या खोदल्या गेल्या. सुदामा, विश्वमित्र, कर्णकौपर, लोमेश ऋषी या लेण्या आहेत यापैकी सुदामा ही प्राचीन आहे त्याला न्युग्रोध गुंफा म्हणतात.

           यानंतर इ स पूर्व दुसऱ्या शतकात नर्मदा पार करून   महाराष्ट्रात पितळखोरा या ठिकाणी पहीला प्रयोग झाला .अनेक दिवसापासून या लेणीबद्दल प्रचंड आतुरता होती की ही लेणी करावी .लेणी बघणे व समजून घेणे हया दोन वेगळ्या गोष्टी आहेत .त्यामुळे या आपल्या प्राचीन वारश्याला समजून घेण्यासाठी कुणीतरी जाणकारच लागेल यात शंकाच नाही .नवी मुंबई येथील सूरज रतन जगताप या लेणी अभ्यासकांशी माझा संपर्क झाला .विशेष म्हणजे "पितळखोरा "हा त्यांचा मुख्य अभ्यासाचा विषय होता .गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे या लेणीवर सवर्धनासह काम सुरु आहे .त्यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रभरातून या आपल्या प्राचीन वारश्यावर प्रेम करणारे अभ्यासकासह एकत्र आलो व गौताळा अभयराण्यातील पितळखोरा या ठिकाणी एकत्र येऊन दिवसभर जगताप सराच्या सोबत राहून लेणी समजून घेतली .महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लेणी पण आजही दुर्लक्षितच असलेली दिसते .पुरातत्व खात्याचे काम आता बऱ्यापैकी दिसते पण पर्यटनाच्या बाबतीत आजही ही महत्वाची लेणी मागेंच आहे .आमची टिम त्या लेणी परिसरात पोहचताच आगे मोहळ उठल्याची आवई आम्हाला कळाली पण अभ्यासकांच्या अनुभवावर आम्ही पुढे निघालो परत येणारे दोन हौशी पर्यटक भेटले आणि ती आवईच ठरली .या लेणीचा उल्लेख टॉलमीच्या मेट्रीला या ग्रंथात आढळतो.महामयुर या बौद्ध ग्रंथातही 'पितलांग्य' असा उल्लेख आढळतो .सोपारा,कल्याण ,भरूकच्छ यासारख्या देशार्तगत बंदराला जोडणाऱ्या पैठण व तेर या व्यापारी मार्गावर आहे .उज्जैन वरून पूर्वी याच मार्गाने प्रतिष्ठाणशी संपर्क होता व पुढच्या काळात तो अजिठा ,घटत्कोच या मार्गाने वाढला व दान देणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्यासुद्धा घटली व पितळखोऱ्याचा विकास कमी होऊन अजिंठा अधिक विकसित होत गेले याचे दुसरे कारण पितळखोऱ्याचा दगड असावा असेही दिसते .याच भागात सातवाहन कालिन भोकरदन (भोगवर्धन)हे शहरही व्यापारी दृष्टया फार प्रगत होते .नुकतेच सम्राटअशोक कालिन भोन येथील प्रगत अश्या शहराचे संशोधन सुरू आहे ते सुध्दा या स्थानापासून जास्त दूर नाही .

    पितळखोरा लेणी ही हीनयान लेणी आहे.या लेणीच्या समकालिन अंजिंठयातील ९ व १० क्रमाकाची लेणी आहे .ही लेणी सुद्धा अजिंठयासारखीच नालाकृती आहे .अरुणा नदीच्या उगम प्रवाहावर याचे निर्माण झाले .सध्या पुरातत्व विभागाने कन्नडच्या बाजूने घाटमाथ्यावरून पायरी मार्ग तयार केला आहे जुना मार्ग आजही चाळीसगाव कडून पाटणदेवी मार्गाने अभयरण्यातून वाट आहे पण येण्यासाठी दोन तीन तास पायी यावे लागते .

    पायरी मार्गाने खाली उतरताच अरुणा नदीची खोल दरी दिसते व उजव्या बाजूला नऊ लेण्याचा समूह दिसतो व समोरच्या बाजूस चार लेण्या खाली उतरल्यावर पूर्ण नजरेस पडतात .

      जेम्स विलसन या इंग्रज अधिकाऱ्याने १८५३ मधे इथे पहीले पाऊल ठेवले .या ठिकाणी कुणीही जात येत नव्हते.याठिकाणच्या चैत्यगृहा समोरील सपूर्ण भाग कोसळून हे चैत्य गृह संपूर्ण झाकलेले होते.हेन्री कझेन्स हा इंग्रज अधिकारी या ठिकाणी आला त्याने सुद्धा हा ढिगारा पाहीला .जेम्स बर्जर्स यांनी येथील शिलालेखाचा अर्थ शोधला . झ्ग्रंजांनी या लेणीचे मोजमाप सुध्दा केले आहे .सूरज जगताप सरांनी त्या काळचे सर्व फोटोग्राफ मिळवून ते सोबत आणले होते .म गो दिक्षित हे इतिहास संशोधक १९४१ साली येथे आले होते.त्यांनी येथील चार लेण्याचा शोध लावला.त्यांनी सुध्दा या लेणीवर संशोधन केले आहे .१९५३ साली पुरातत्व विभागाने या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून सरक्षित केले .१९५७ -५८ मधे या ठिकाणचा मोठा ढिग काढण्यात आला .या ढिगाऱ्याखाली प्राचीन परंपरेचा उलगडा करणाऱ्या अनेक मौल्यवान वस्तु ,शिल्पे सापडली याचा सचीत्र उलगडा अभ्यासकांनी प्रत्यक्ष ज्या ठिकाणी जे शिल्प होते त्या ठिकाणी आम्हाला घेऊन  केला .

      आता पर्यन्त आम्ही जेवढया लेण्या पाहील्या तेवढया लेण्यात पाण्याची व्यवस्था ही पानपोढी च्या माध्यमातून केलेली दिसते म्हणजे दगडात कोरुन मोठ मोठे हौद तयार करुन त्यात पावसाचे पाणी साठवणे .पण या ठिकाणी तशी रचना दिसली नाही याचे कारण तेथील प्रस्तराचा पोत होय हा प्रस्तर एकसंघ असणे आवश्यक असतो .त्यातून पाणी न झिरपणे ,ठिसूळ नसणे गरजेंचे असते पण या ठिकाणी मात्र येथील प्रस्तर एकसंघ नसल्याने व खडक बेसॉल्ट असल्याने मात्र या लेणीचे पुढील काळात खूप नुकसान झाले .

     पाण्याच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात प्राचीन म्हणता येईल असा पाण्याचा बंधारा या ठिकाणी २२०० वर्षापूर्वी  ठिकाणी बांधण्यात आला आजही त्याचे अवशेष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात अरुणा नदीचा मुख्य प्रवाह लेणीच्या वरच्या बाजूस अडविण्यात आला व त्या ठिकाणी 22 लाख लिटर पाणी थांबवता येईल अशी बांधणी करण्यात आली आजही नदीतील पात्रात दगडांमध्ये एका सरळ रेषेत लाकडी थांब उभे करण्यासाठी दगड गोल ओंडक्याच्या आकाराचा कोरलेला आहे त्याला सहाय्यक म्हणून दोन्ही बाजूला छोटे छोटे  खाची केलेली आहेत. या मुख्य लाकडांच्या आधाराने दगड व मातीचे लेपन करून हा बंधारा बांधला गेला असावा असे दिसते. पानपोढी ऐवजी या बंधाऱ्याचे पाणी या लेणी समूहात राहणारे बौद्ध भिक्खू वापरत असत.

खाली उतरतात उजव्या बाजूला आपल्याला विहार नजरेस पडते. विहार म्हणजे त्याकाळी बौद्ध भिक्खू साठी ही निवासाची व ध्यानधारणेसाठी ची जागा होती. आजही आपल्याला त्या ठिकाणी लाकडी रिप बसवण्यासाठी ची दगडात कोरलेली खोबणी दिसतात या माध्यमातून त्याकाळी लाकडी कंपार्टमेंट करून ही निवासस्थाने तयार केलेली दिसतात. खोल दरीच्या बाजूने ही आजच्या काळात ज्या पद्धतीने आपण आपल्या घराला पॅरापिट करतो अगदी तशीच रचना दरीच्या बाजूने केली असल्याचे जाणवते. त्याकाळी ही लाकडी रचना आपल्याला आता दिसत असलेल्या दगडातील कोरीव कामावरून सहज लक्षात येते.

      हिनयान पंथीय बौद्ध भिक्खू उपासक चैत्यगृह मध्ये आपली प्रार्थना ध्यानधारणा करण्याचे काम करत असत पुढच्या भागात विहाराच्या समोरच एक सुंदर भव्य असे   गजपृष्ठाकार आकाराचे चैत्यगृह नजरेस पडते. आत गेल्यानंतर या चैत्यगृहात स्तुप आहे . प्रस्तर एकसंघ नसल्याने हा स्तूप सध्या अर्धवट दिसतो .छत्रावली,यष्टी,हर्मिका हा भाग दिसत नाही .यापूर्वी यावर दगडी बांधकाम करून पूर्ण केल्याचे जाणवते ज्यावेळी चैत्यगृहात पडझड झाली त्यावेळेस या बौद्ध स्तूपाचे नुकसान झाले असावे. भाचे येथील चैत्यगृहात  असलेला स्तुप हा जवळपास समकालिन असावा असे अभ्यासकाचे मत आहे. तथागत गौतम बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांच्या पार्थिव अवशेषांवर गया, सारनाथ ,नालंदा, या ठिकाणी भव्य स्तूप उभारण्यात आले होती . त्यांनी वापरलेल्या वस्तूवर ही स्तूप बांधले जाऊ लागले त्यांना परिभाषिक स्तुप असे म्हणतात. पितळखोरा येथील चैत्यगृहात त्याचे पावित्र्य जपत सर्वांनी बुद्ध वंदना पार पडली . एकूण 37 खांबावर उभा असलेला हा चैत्यगृह आहे सध्या बरीच खांब पडलेली आहे. कृत्रिम रित्या दगडाचा वापर करून खांबाची ची निर्मिती निजामाच्या त्यांनी दिलेल्या मदतीतून त्या काळात केली गेली असे संशोधकांनी सांगितले या विषयावर संशोधनही सुरू आहे. मिथिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दगडी भिंती व खांब अत्यंत गुळगुळीत केलेले दिसतात. या चैत्यगृहाचे एकमेव वैशिष्ट्य असे आहे की हिनयान चैत्यगृहात नंतरच्या काळात बुद्ध चित्रांची निर्मिती केली गेली अजिंठा मध्ये ज्या पद्धतीची चित्रशैली आहे अगदी तशीच परंतु त्यापूर्वीची अशी ही चित्रशैली दिसते अजिंठ्यातील चित्रशैलीत जातक कथांचा चित्रांचा समूह दिसतो परंतु या ठिकाणी मात्र केवळ बुद्धांच्या चित्रांचा समूह आहे यामध्ये कमल पुष्पात उभे असलेले तथागत बुद्ध त्याच पद्धतीने ध्यानस्थ असलेले बुद्ध तसेच डोळे उघडे असलेले बुद्ध या चित्र समूहात दिसतात.प्रत्येक बुद्धचित्राच्या मागे प्रभामंडळ काढलेले आहे . काजळी वापरून लिहिलेला लेख आजही येथे बघायला मिळतो. चैत्यगृहात गजपृष्टा कार आकाराच्या स्तूपाच्या वरील भागात लाकडी कमानीचा वापर केलेला दिसतो या लेणीत दगडावर विशिष्ठ प्रकारच्या चुना - मातीचा-इतर घटकाचा लेप लावून त्यावर चित्रकाम केलेले दिसते. आज तेथील लाकडी काम गळून पडलेली आहे ज्या ठिकाणी हे काम होते तो भाग आता बिना लेप लावलेला व चित्र काम न केलेला आहे. याच चैत्या तील दहाव्या व अकराव्या खांबावर दोन ब्राम्ही लिपि मधील शिलालेख आहेत . षटकोनी आकारात तासलेल्या या खांबावर अत्तर बनविणाऱ्या  मितदेवाचे दान आहे दुसऱ्या खांबावर संघकाचे दान आहे हे दोघेही प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण येथील आहेत. या दोन्ही खांबावरील चित्र कामाचा लेप गळून पडल्यामुळे हा शिलालेख उघडा पडला आहे . त्यामुळे त्याचे वाचन करता आले. लेणीच्या अभ्यासकांच्या मते या चैत्यगृहातील चित्राखाली अजूनही असे शिलालेख असू शकतात. ज्याच्या दानातून ज्या लेणीच्या ज्या भागाची निर्मिती व्हायची त्या भागावर बहुतेक वेळा त्यांच्या नावाचा उल्लेख असलेला  शिलालेख आढळतो. असे शिलालेख इतिहास समजून घेण्यासाठी फार उपयोगी पडतात.दोन्ही बाजूने दोन ,दोन ढेरपोटया यक्षाने पायरी तोलून धरण्याचे शिल्प आहे .आजही त्या यक्षाच्या चेहऱ्यावरील हावभाव जीवंत वाटतात .'यक्ष ' हा बौध्द-हिंदू-जैन या सर्व धर्माच्या विवेचनात आढळतो .त्याला या तीनही धर्मात महत्वाचे स्थान आहे . याच ठिकाणी डोक्यावर भार घेत दोन्ही हाताने तो भार पकडलेला फेटाधारी यक्षाचे पूर्ण शिल्प उत्खलनात सापडले आहे .''संकरीन यक्ष " असे त्याचे नाव असून त्याचा उल्लेख महामयुरी या ग्रथात येतो .आज हे अप्रतीम शिल्प दिल्ली येथील राष्ट्रीय सरक्षण केद्रात ठेवण्यात आले आहे .

     चैत्यगृहातून बाहेर पडताच.सोंड  तुटलेला नऊ हत्ती दिसतात.हा एका विहाराचा भाग आहे वरील प्रस्तर या हत्तीशिल्पावर कोसळले व ही शिल्पे तुटली .नऊ हत्तीच्या समोर पूर्णाकृती नऊ माहुतांची शिल्पे होती त्यांच्या पायाचे अवशेष आजही दिसतात .हत्ती सुद्धा पूर्णणे अलंकृत आहेत .तुटलेल्या माहुतांचे शीर,धड व हत्तीचे सोंडीचे अवाढव्य अवशेष दरीच्या काठावर आजही पडून आहेत .पाठीमागे असलेले विहार या हत्तीच्या रथावर आरूढ आहे अश्या प्रकारचे हे भव्यदिव्य विहाराची ही वास्तु होती. या विहारात वर जाण्यासाठी डाव्या बाजूला एक दरवाजा पायऱ्यासह कोरलेला आहे .या ठिकाणी पूर्वी लाकडी द्वार होते हे तेथील कोरीव कामावरून दिसते .सर्वात महत्वाचे म्हणजे या द्वारावर सहा फुट उंच असे हातात भाला घेतलेले द्वारपाल आहेत .यापैकी एका द्वारपालाचे शिल्प अलीकडच्या काळात  तोडल्याचे दिसते .बर्जेस,फग्र्युसन,पर्सी बाऊन या पाश्चात्य जाणकाराच्या मते ग्रीक,इजिप्त ,इराण आदी शिल्प शैलीचा प्रभाव काही अंशी प्राचीन लेणी समूहात जाणवतो याची प्रचीती या द्वारपालाच्या पोषाखावरुन येते .याशिवाय विहारातील बहुतेक द्वारावर पंख असतेले घोडे,हत्ती आदि प्राण्याचे शिल्पे आहेत .उतुंग भरारी घेणारे आवेशपूर्ण शिल्पे ही ग्रीक,रोम,इराणी वास्तुकलेची छाप जाणवते .या भागातून ग्रीक व रोमशी सातवाहन काळात नाणेघाट _कल्याण या मार्गाने सागरी व्यापार चालतच होता .

     या द्वाराच्या डाव्या बाजूला पंचफणी नागाचे शिल्प आहे.या शिल्पाचा उठावदार पणा आता दिसत नाही या नागाच्या पाचही मुखातून आजही पाणी येते .खडकाच्या प्रस्तरात मुरलेले पाणी एकत्रीत करून भूमीगत पध्दतीने या नागफणी पर्यन्त आणले गेले आहे .कोरीव काम करून पाण्याची नहर भूमीगत आहे .जागोजागी छोटे मॅन होल ठेवून त्यात घडीव दगड बसविला गेला आहे जेणे करुन त्यामधे साचलेला गाळ काढता येईल .पूर्वी पूर्णतः दबावाने हे पाणी येत असावे .कारंज्याच्या रूपाने ते नागफणीतून बाहेर पडत होते .मुख्यद्वारावर असल्याने विहारात जाण्या अगोदर स्वच्छतेसाठी असावे .इस पूर्व दुसऱ्या शतकातील जलव्यवस्थापण आजही लाकडी बंधारा व या भूमीगत पाणी रचनेतून दिसून येते .याच द्वाराच्या वर एक आयताकृती रिक्त चौकट दिसते म्हणजे त्यामधील घडीव दगडी  पैनल हा खाली  ढिगाराखाली सापडला होता आज या पैनल वरील शिल्प छत्रपती शिवाजी महाराज म्युझीअम मुंबई येथे बघायला मिळते .या शिल्पात दोन्ही बाजूने ह्त्ती व मधे स्त्रीचे शिल्प आहे.अभ्यासक या शिल्पास महामायादेवी संबोधतात काही या शिल्पास गजलक्ष्मी म्हणतात .अशी शिल्पे जुन्नर परिसरात अनेक भागात आढळतात .डाव्या बाजूला असलेल्या चार लेण्यामधे विहार कोरलेली आहे .वर्षानुवर्ष हा एकसंघ नसलेला प्रस्तर सतत ढासळत राहील्याने अरुणा नदीच्या दरीत मोठमोठया दगडांचा खच पडलाय ,नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने सततच्या माऱ्याने त्यावरील कोरीव काम नाहीसे झालय .एके काळी सुवर्णकाळ ठरलेला हा आपला वारसा आजही आपली वाट पाहतोय .सूरज जगताप सरांसारखी माणसे शेकडो किलोमिटर अंतरावरून येवून येथील अजूनही न उलगडलेल्या गोष्टीचा शास्त्रशुद्ध पद्धतीने शोध घेत या प्राचीन ठेव्याची माहीती लोकांना करुन देत आहेत .असे हजारो वर्षापूर्वीचे आपल्।या पूर्वजांचे असंख्य ठेवे आपल्या परिसरात आहेत त्याचे संवर्धन व जतन होणे ही काळाची गरज आहे .हा वारसा आपल्याला सदैव प्रेरणाच देत राहील.



संदर्भ

-लेणी महाराष्ट्राची _डॉ दाऊद दळवी

-लेणी अभ्यासक सूरज जगताप (मुंबई)यांच्या सोबत प्रत्यक्ष अभ्यास दौरा


No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...