Wednesday, July 9, 2025

खानदेश

खानदेश | Discover Maharashtra

Discover Maharashtra

खानदेश –

तापीच्या खोऱ्यात १६० किलोमीटर अंतरावर पसरलेला भुभाग, तेवढीच लांबी रूंदी असलेला प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तर भाग, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा, आशिरगड आणि तोरणमाळ हे विस्तृत पठारी किल्ले दोन सीमा तर ईशान्येला सैदवापास जो आग्रा रोड प्राचीन काळापासून प्रचलित असलेला, या घाटाचे भिल्ल समाज रक्षक म्हणून ओळखले जातात. आदिम समाज पुढे शहादा येथील डोंगररांगा खोलगट बारीक धार जी नर्मदा नदी सातपुड्याच्या रांगांमधून वहाते. हीच सीमा ओळखली जाते आणि उत्तर भारत दक्षिण भारत वेगळा करते, जो उत्तरपथ आणि दक्षिणपथ या नावाने जवळपास इसवीसन पुर्व पाचव्या शतकापासून प्रचलित असलेला आहे. दक्षिणेकडे भागात अजिंठा आणि सातमाळा पर्वतरांगा नाशिकजवळच्या चांदोर या नैसर्गिक सीमा मानायला हरकत नाही. वायव्येस आर्वा किंवा लळींग आणि गाळणा डोंगररांग, आणि पुढे सह्याद्री जो वायव्येस, नंदुरबारच्या पुढे, पंचपांडव पुर्वेकडील उंच डोंगर आणि मोन्धीममाळ यावलजवळ, ताजदीनवली नर्मदा खोरे आणि तापी खोरे जोडणारे, पश्चिमेला बाबाकुंवर, आणि अक्राणी महल , तोरणमाळ ही पर्वतशृंखला आहे.या टोकाला प्राचीन नगर प्रकाशे तर दुसरीकडे आशिरगड- बऱ्हाणपूर या सीमा, पुर्णा खोऱ्यात हत्ती डोंगररांग.

या सर्व रांगात उगमपावणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या प्रमुख नद्या तापी, पुर्णा, गिरणा, बोरी, वाघुर, पांजरा, नर्मदा यांच्या विस्तृत पात्रांनी आणलेल्या गाळातील शेती सुपीक जमीन बनली.  त्यांच्या संगमावर तिर्थस्थळे जसे की दक्षिण काशी प्रकाशे, चांगदेव मुक्ताबाई,  इत्यादी होय.

जंगले असल्याने निम्मे उत्पन्न जंगलसंपत्ती आणि निम्मे लोक जंगलावर अवलंबून होते. दोन स्वतंत्र संस्कृती नांदत होत्या. नदीकाठी वसती करून शेती पिकवणारा समाज आणि जंगलांच्या आधारे पशुपालन करणारा समाज.. गवळी समाज..

अबुलफजल त्याच्या ऐन ए अकबरी मध्ये उल्लेख केला आहे की, खानदेश हे नामकरण गुजरातचा सुलतान अहमद पहिला यांनी इसवीसन १४१७ मध्ये मलिक नासीरखान या फारुकी राजाच्या नावावरून या प्रदेशाला दिले आहे.पण सिंक्लेअर यांच्या मते महाभारतातील खांडस या जंगलावरून खानदेश हे मुस्लिम राजवटीच्या आधीपासुन होते. सातपुड्याच्या कुशीत राहणारे भिल्लाव्यतिरिक्त भिलालस, काही राजपुत, वंजारी,पावरा जमाती होत्या. पश्चिम भागात कातकरी, गावित, मावची, पारधी, वडार आणि फासेपारधी आहे. सातपुड्याच्या जंगलातील सागाचे लाकुड हे आदिम काळापासून स्मगलिंगचे आकर्षण आहे.

या भागात लाकडापासून बैलगाडी इमारतीचे लाकुड आणि कलाकृती असलेले फर्निचर हे आकर्षणे राहिली आहेत.

लोक सर्वात आधी वसती करणाऱ्या लोकांत लाॅसन यांच्या मते, संस्कृत भाषा बोलणारे गुजरातच्या किनाऱ्यावरून तापी खोऱ्यात खाली उतरून आलेत. प्रकाशे येथील उत्खननामुळे या मताला दुजोरा मिळतो की  सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात शेती सौराष्ट्र कडून आली, डॉ वसंत शिंदे यांच्या पीएचडी थेसीस आणि नंतरच्या महाराष्ट्रातील आदिम शेतकरी या संदर्भात केलेल्या संशोधनानुसार हा निष्कर्ष काढला गेला. पहिला ऐतिहासिक उल्लेख टाॅलेमीच्या  ग्रंथात इसवीसन १५० मधील फिल्लेटी आणि कोंडली कदाचित भिल आणि गोंड हे नर्मदेच्या दक्षिणेस रहाणारे असा उल्लेख आहे. विल्सन सातवा यांच्या मते भिल्ल हे पुलिंद असा उल्लेख असावा. दुसरा टालेमीचा उल्लेख म्हणजे ताबास्सी हे खानदेशातील रहिवासी कदाचित बुध्द भिक्खू असावेत जे अजिंठा येथील लेणीत रहात असावेत.

दुसरा उल्लेख म्हणजे अहिरांचा जे आशिरगड भागात राहिले स्थानिक परंपरेनुसार ते राजपुत जमातीचे वेगवेगळ्या सोळा, इसवीसन पुर्व सोळाशे मध्येच रहात होत्या, पण याला काहीच पुरावा उपलब्ध नाही. नेमाडी, मराठी आणि गुजराती या नंतरच्या काळात आलेल्या लोकांनी भिल्ल कोळ्यांना आत ढकलत स्वतः वसती केली, या संदर्भात टाॅलेमी उल्लेख करतो. हे गोंडच चाळीसगाव परिसरात दिसणारे गवळी आहेत का?  नंतरच्या काळात झालेल्या विविध आक्रमणात आलेले आणि येथेच स्थायिक झालेले कच्छ गुजरात आणि काठीयावाडचे लोक नाशिक अहमदनगर तसेच महाराष्ट्रातील इतर भागात दिसतात.

कनिंगहॅम यांच्या आर्किआलाजी रिपोर्ट मधील आबर्स जी एक सिथियन जमात होती,जी इसवीसन पुर्व पहिल्या दुसऱ्या शतकात उत्तर भारतात आली, त्यादरम्यान उत्तर भारतीयांना दक्षिणेकडे ढकलले गेले कदाचित हेच भारतीय असू शकतात. नाशिक लेणीतील शिलालेखात या अहिर राजांचा उल्लेख आहे,पण ते चौथ्या शतकातील आहेत. पाटणे आणि मानेगाव येथील उत्खननामुळे अश्मयुगीन काळापासून वसती होती हे लक्षात येते. जवळपास चाळीस हजार वर्षापासून मानवी वसती होती. पण ही उत्खनन १९७३ साली झालेले आहे आणि आधुनिक पुरातत्वीय पध्दती आणि दृष्टिकोन हा अमुलाग्र बदलला आहे त्यामुळे या भागात परत उत्खनने होऊन अभ्यास होण्याची गरज आहे. बहाळ येथे ताम्रपाषाणयुगीन काळातील अवशेष मिळाले आहेत.

मौर्य, शुंग, सातवाहन, क्षत्रप यांच्या राजवटीचे मोघम पुरावे आहेत पण पुरातत्वीय काळ आणि ऐतिहासिक काळ यांचा सलग पट मांडता आलेला नाही.  क्षत्रपांच्या नंतर जी मांडलिक राजे शिलालेखात आणि ताम्रपटात दिसतात.ज्यात आभीर,(आभीर क्षत्रपांच्या काळात मोठमोठ्या पदांवर होती,)  श्रीपर्वतीय, शक, किलकिल , महाराज स्वामीदास, भुलुंड जे धृतराष्ट्र वंशाचे, वाकाटक  इत्यादी तसेच सहाव्या शतकातील हुण, चालुक्य, सेंद्रक , हैहय किंवा कलचुरी, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव तर आशिरगड भागात दिसणारे आभीर आणि चौहान जे आशिरगडावर इतिहास पुर्व काळापासून असल्याचा दावा करतात.

अजिंठा, घटोत्कच आणि पितळखोरा लेणी इसवीसन पुर्व दुसऱ्या शतकापासून आहेत. राजस्थान येथील टोड जे टाक किंवा तक्षक हे इसवीसन पुर्व सहाव्या शतकात सिथियन आक्रमणाच्या काळात विखुरलेले आहेत ते आशिरगडावरील असावे,नाग राजे इतिहासात गायब झाले त्यावर परत संशोधन जरूरीचे आहे. फारूकी आणि पुढच्या काळाचा इतिहास ज्ञातच आहे.खानदेश.

राजकिय इतिहासाव्यतिरिक्त आर्थिक, धार्मिक आणि लोक संस्कृती यांचा इतिहास असतो. माणसांनी एकत्र येऊन जगण्याची लढाई यशस्वी करून नवीन काही शोधणे हाच खरा इतिहास आहे. खानदेशातील शेतीचा इतिहास कापूस उत्पादन आणि फळफळावळ पिकवून तसेच अतिरिक्त उत्पादन काढून व्यापार वाढवणे, शेतीसाठी बांध बांधून सिंचन व्यवस्था, निळ, आणि इतर धान्ये कडधान्ये डाळी आणि साखर उत्पादन करून इतर भागात पुरवठा करण्याची रीत आधीच्या काळापासून होती. खानदेशातील डोंगररांगांमध्ये जवळजवळ ९४ घाटमार्ग होते, फक्त पश्चिमेला जोडत तर पंधरा सह्याद्रीच्या भागात,५४ हे सातपुडा भागात २५ सातमाळा पर्वतरांगा ना जोडणारे होते, जे डांग गुजरात,माळवा, मध्यप्रदेश आणि उत्तर भारत दक्षिण भारत यांना जोडणारे होते. जे ब्रिटिश काळापर्यत सुरू होते. हे वर्णन जितके अधिक लांबवता येईल तेवढे लांबवू शकते.

इतिहासाचा मुख्य हेतू भूतकाळाच्या प्रकाशात वर्तमान समजून घेणे आहे. कदाचित खानदेश म्हणजे फक्त दक्षिणेचा दरवाजा आणि उत्तरपथ आणि दक्षिणपथ जोडणारा दुवा नसुन एक स्वतंत्र संस्कृती विकसित करणारा भाग होता हे या अभ्यासाअंती लक्षात येईल.

@ सरला

https://www.discovermh.com/khandesh-info/


यादवकालीन खानदेश भाग १ | Discover Maharashtra

Discover Maharashtra

यादवकालीन खानदेश भाग १

महाराष्ट्राधीश असे स्वतःला अभिमानपूर्वक म्हणवून घेणारे एकमेव राजघराणे यादवांचे होय. त्या घराण्याने सुमारे पाचशे वर्षें (शके ७७१ – इसवी सन ८५० ते शके १२३३ – इसवी सन १३११) महाराष्ट्रावर राज्य केले. वैभवशाली राष्ट्र म्हणून त्या राज्याचा लौकिक आहे. यादव राजवटीतच ‘मराठी’ भाषा समृद्ध होऊन अनेकोत्तम साहित्यकृतींनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले.(यादवकालीन खानदेश)

यादव राजे स्वतःस अभिमानाने श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवकुळाचा प्रारंभ पौराणिक दृष्टीने श्रीकृष्ण – प्रद्युम्न (मदन) – अनिरुद्ध – वज्र – प्रतिबाहु – सुबाहु असा आहे. पण ऐतिहासिक दृष्ट्या पहिला ज्ञात यादवराजा म्हणजे ‘द्दढप्रहार’. (शके ७७२ – इसवी सन ८५० ते शके ८०२ – इसवी सन ८८०). द्दढप्रहाराने स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर त्याचे स्वतःचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात निर्माण केले. ‘चंद्रादित्यपूर’(चांदवड, जिल्हा नासिक) ही त्याच्या राजधानीची पहिली नगरी.

नासिक जिल्हा, खानदेश व नगर जिल्ह्याचा काही भाग याला मध्ययुगात ‘सेऊण देश’ असे म्हणत. सेऊणदेश ही यादवांची पहिली भूमी. यादव हे गुजरातेतील द्वारकेहून आले. तसा उल्लेख जिनप्रभु ह्या जैन तीर्थंकारांनी लिहिलेल्या ‘नासिक्यकल्प’ ह्या ग्रंथात आलेला आहे. त्यात असे म्हटले आहे, की ‘द्वारकेच्या वज्रकुमार नावाच्या यादव क्षत्रियाच्या स्त्रीला जैन तीर्थकार चंद्रप्रभसाधु यांनी आश्रय दिला, तिचा पुत्र ‘द्दढप्रहार’ हा सामर्थ्यवान योद्धा झाला. त्याला लोकांनी ‘तलारपद’ (नगररक्षक, कोतवाल) दिले.’ नगररक्षक ‘द्दढप्रहार’च पुढे स्वपराक्रमावर स्वतंत्र राजा झाला.

यादवांचे सुमारे बत्तीस कोरीव लेख उपलब्ध आहेत. यादवांचा इतिहास समजावून घेण्याची साधने म्हणजे यादवराजांनी केलेले ताम्रपट, कोरलेले शीलालेख, हेमाद्री पंडिताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या संस्कृत ग्रंथातील ‘राजप्रशस्ती’ हा खंड व मध्ययुगीन मराठी ग्रंथसंपदा (उदाहरणार्थ, लीळाचरित्र, स्थानपोथी, ज्ञानेश्वरी).

द्दढप्रहाराने त्याच्या राज्याचा विस्तार चंद्रादित्यपूर (चांदवड) नगराच्या परिसरापासून थेट अंजनेरीपर्यंत (तालुका त्र्यंबकेश्वर) व चांदवडच्या दक्षिणेस सिंदीनेरपर्यंत (सिन्नर) केला. त्याच्या नंतर राजपदावर आला त्याचा मुलगा सेऊणचंद्र (प्रथम). तो वडिलांसारखाच पराक्रमी निघाला. त्याने त्याच्या राज्याच्या कक्षा आश्वी, संगमनेर पर्यंत विस्तारल्या व त्याची राजधानी राज्यकारभाराच्या सोयीसाठी चंद्रादित्यपुराहून ‘सिंदीनेर’ म्हणून त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या नगरात आणली. सिन्नरचा प्राचीन साहित्यात ‘श्रीनगर’ असा उल्लेख आहे. सेऊणचंद्र (प्रथम) – (शके ८०२ ते ८२२) पासून त्याच्या नंतर धाडियप्प, भिल्लन (प्रथम), श्रीराज, वादुगी, धाडियप्प (द्वितीय), भिल्लम (द्वितीय), वेसुगी, अर्जुन, भिल्लम (तृतिय), वादुगी (द्वितीय), वेसुगी, भिल्लम (चतुर्थ), सेऊणचंद्र (द्वितीय), सिंघणदेव, मल्लुगी, भिल्लम (पंचम) याच्यापर्यंत (शके ११०७ ते १११५) अशी सुमारे तीनशे वर्षें यादवांची राजधानी ‘सिन्नर’ येथे होती. भिल्लम (पाचवा) याने यादवांची राजधानी शके ११०७ मध्ये सिन्नरहून देवगिरी (आताचे दौलताबाद, जि. औरंगाबाद) येथे नेली व प्रसिद्ध देवगिरीच्या किल्ल्यावरून महाराष्ट्राचा राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.

यादवांचे राज्य उत्तरेस थेट नर्मदेपासून दक्षिणेस कृष्णा-कावेरीपर्यंत व पूर्वेस थेट नागपूर (विदर्भप्रांत) ते पश्चिमेस महिकावती (ठाणे, कोंकणप्रांत) पर्यंत विस्तारले होते. यादव राजांनी संपत्ती, वैभव, भूविस्तार निर्माण करून वैभवशाली राष्ट्र म्हणून महाराष्ट्रास हिंदुस्थानच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून दिले. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, वापी (बारव), प्रचंड सैन्य, सोने, मोती, राजवस्त्रे यांचे वर्णन हा स्वतंत्र ग्रंथाचा, लेखनाचा विषय आहे. राजधानी देवगिरी व देवगिरीचा किल्ला या संदर्भातही विस्तृत लेखन झालेले आहे.

सिन्नर शहराच्या दक्षिणेस ‘शिव’ नदी आहे. त्या शिवनदीकाठी सिंदीची झाडे होती. ती सद्य काळात तुरळक आढळतात. सिंदीच्या बनाशेजारी उत्तर बाजूस उंचावर वसलेले गाव म्हणजे ‘सिंदर’ होय. ‘गावठा’ म्हणून सिन्नरमध्ये जो भाग ओळखला जातो तो भाग म्हणजे सिन्नरची मूळ वस्ती होय. सेऊणचंद्राने ‘सेऊणपुरा’ या नावाने स्वतंत्र पेठ किंवा वसती निर्माण केली असे वसई व आश्वी येथील ताम्रपटात म्हटले आहे.

श्रीमत्सेऊणचंद्रनाम नृवरतस्मादभूदभमिपः नित्यंदेशपदिधराजविषये स्वं नाम संपादनयन्।

येनाकारि पुरं च सेऊणपुरं श्रीसिंदीनेरे वरे तत्पुत्रः कुलदीपको गुणानिधी श्रीधाडियप्पस्त्रतः।।

असे अश्वी ताम्रपटात (शके १०२०) म्हटले आहे.

यादवांना ते सेऊणदेशाचे आहेत याचा अभिमान होता. शिवनदीचा उत्तर काठ ते सरस्वतीनदीचा दक्षिण काठ; तसेच, पूर्वेस सरस्वती नदी ते पश्चिमेस थेट शिवाजीनगर (बसस्टँड जवळचे) तेथपर्यंत पश्चिमेस असलेल्या त्यावेळच्या पारापर्यंत प्राचीन सिन्नर नगरीचा विस्तार होता. स्वतंत्र पेठा (पुर), वसाहती (राजवाडे, सामंतांचे राजवाडे, सैन्यतळ, हत्ती, घोडे यांचे हत्तीखाने व तबेले) यांनी यादवांची राजधानी गजबजलेली होती. त्याचे वर्णन ‘लीळाचरित्र’ या मराठी भाषेतील ग्रंथात (शके १२००) म्हाईमभट सराळेकर यांनी केलेले आहे.

‘श्रीनगर’मधील श्री म्हणजे संपत्ती, वैभव. श्रीनगर म्हणजे संपत्ती व वैभव यांनी संपन्न असलेले नगर. ‘ततः राजा नजराजधानी मधिष्ठितं श्रीनगरं गरीयः’ असे व्रतखंडाच्या राजप्रशस्ती श्लोक – २२ मध्ये सिन्नरला म्हटलेले आहे.

यादव राजे सुसंस्कृत व प्रजाहितदक्ष होते. त्यांनी राज्यविस्ताराबरोबरच भव्य राजप्रासाद, किल्ले, मठ, मंदिरे, वापी (बारव), तडाग (तळे) यांच्या निर्मितीकडे लक्ष दिले. ते राजे गेले पण त्यांनी, त्यांच्या सामंतांनी निर्माण केलेल्या वास्तू त्यांच्या कार्याची आठवण देत आहेत.

श्रीचक्रधरस्वामी व भिल्लममठ ही मंदिरसदृश पक्क्या दगडांमध्ये बांधलेली वास्तू सिन्नर शहरात चौदाचौकाचा वाडा (राजे फत्तेसिंहवाडा) या भागात आहे. महानुभव पंथ संस्थापक भगवान श्रीचक्रधरस्वामी यांचे या भिल्लममठात शके १९९०-९१ मध्ये दहा महिने वास्तव्य झाले. त्यामुळे ते महानुभाव पंथीयांचे देवस्थान ठरले आहे. वास्तू उत्तराभिमुख आहे. ती महानुभव श्रीदत्तमंदिर किंवा श्रीकृष्णमंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीनगरी भिलमठी अवस्थान (लीळा पूर्वार्ध – २३६) या लीळेत ते वर्णन आहे. मंदिराचा भव्य गाभारा व दगडी खांबांची ओसरी अशी ती भक्कम वास्तू यादव राजा, भिल्लम (तृतीय) याने शके ९४८ (इसवी सन १०२६) मध्ये निर्माण केली. त्याच्या नावावरून ते मंदिर ‘भिल्लममठ’ या नावाने प्रसिद्ध आहे. मठाला चारही बाजूंनी दगडी परकोट होता व पूर्वाभिमुख प्रवेशद्वार होते. त्याच मठात मराठी भाषेची आद्यस्त्री कवयित्री महदंबा व महानुभव पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेवाचार्य यांचे रामसगाव (जिल्हा जालना) येथून आगमन झाले. त्यांनी शके ११९१ मध्ये चैत्र महिन्यांत ‘दवणा’ ह्या सुगंधी झाडाची पाने, फुले श्रीचक्रधरस्वामींना अर्पण करून ‘दमणक पर्व’ साजरे केले.

श्रीचक्रधरस्वामींनी केलेले तत्त्वनिरूपण, त्यांच्या दहा महिन्यांच्या काळातील लीळा यांचे वर्णन मराठी भाषेचा आद्य गद्य ग्रंथ लीळाचरित्र यामध्ये (पूर्वार्ध लीळा क्रमांक २३५ ते २४६) आलेले आहे; तसेच, त्या काळात स्वामी सिन्नरच्या परिसरातील ज्या ज्या ठिकाणी (मठ, मंदिरे आदी) गेले त्यांचे वर्णन ‘स्थानपोथी’ (शके १२७५) या ग्रंथात आलेले आहे. भिल्लममठ माद्री (शके ११९२ ते १२३५) याच्या आधीपासून होता. त्यामुळे त्याला हेमाडपंथी देऊळ म्हणता येत नाही. ‘भिल्लममठ’ किंवा श्रीदत्तमंदिर सुस्थितीत असून त्या मूळ वास्तूस धक्का न लावता सभामंडपासह मंदिरनिर्मिती करण्यात आली आहे. ते मंदिर श्रीचक्रधरस्वामींच्या निवासाने, आसनाने व लीळांनी पावन झाले आहे. तेथे स्थान निर्देशक ओटे (पंथीय भाषेत स्थान) असून मुख्य स्थानाच्या जागी श्रीकृष्णमूर्तीची स्थापना केलेली आहे. भिल्लममठाचे पट्टीशाळेत (दगडी पडवी) शके १४१५ मध्ये कवी संतोषमुनी यांनी ‘रुक्मिणीस्वयंवर’ या ग्रंथाची पूर्णता केली.

गोंदेश्वर मंदिर ही ‘पंचायतन’ पद्धतीची भव्य वास्तू यादवांचे सामंत गोविंदराज यांनी शके ९९० च्या दरम्यान निर्माण केलेली आहे. गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरचे वैभव आहे. शांत, एकांतस्थळी असलेल्या या मंदिरात श्रीचक्रधरस्वामी गेले होते. चौकात डावीकडे त्यांचे आसन झाले व मंदिरापुढे असलेल्या मंदिराच्या निर्मितीची कथा (पद्मेश्वर मंदिर, आताचे मुक्तेश्वर मंदिर, सिन्नर-शिर्डी रस्ता) त्यांनी भक्तांना सांगितलेली आहे (पूर्वार्ध लीळा क्रमांक २४५ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वरू कथन).

सरस्वती नदीच्या दक्षिण काठावर असलेले आवेश्वर मंदिर प्राचीन पूर्वाभिमुख मंदिर, हल्ली ऐश्वरेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या उत्तर पट्टीशाळेत श्रीचक्रधारस्वामींचे आसन झालेले आहे.

यादवकालीन चतुर्विधांचे मंदिर या नावाची प्राचीन वास्तू सरस्वती नदीच्या दक्षिणकाठी होती. चतुर्विधाचा मठ मातीत दबलेला होता. तेथे स्वामींचे आसन झालेले आहे. मठाच्या ठिकाणी ‘पट्टीशाळा मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर व चतुर्विधाच्या मठाची उर्वरित वास्तू आहे.

वैजनाथाचे मंदिर ही यादवकालीन वास्तू शीव नदीच्या दक्षिण काठावर होती. तेथे स्वामींचा तीन दिवस निवास झालेला आहे. मूळ वास्तूच्या चौकाच्या ठिकाणी ‘भोजनता मंदिर’ या नावाचे श्रीचक्रधरस्वामींचे मंदिर आहे. तेथेच यादवसम्राट महादेवराय यादव हा पुढे देवगिरीहून मुद्दाम घराण्याच्या मुळच्या राजधानीच्या ठिकाणी आला होता (शके ११९०). त्याचा उल्लेख लीळाचरित्र, पूर्वार्ध लीळा क्रमांक २३७ मध्ये आलेला आहे. महादेवराय यादवाने श्रीचक्रधरस्वामींच्या दर्शनाच्या हेतूने भिल्लममठात त्याचा सेवक पाठवला होता. तेव्हा स्वामी पट्टीशाळेत खांबाजवळ गुजराती भाषेत त्या सेवकाशी बोलले. तो पवित्र खांब वंदनीय झाला! तेथे व जेथे श्रीनगरदेवाचार्य व महदाईसा यांना स्वामींचे प्रथम दर्शन झाले त्या ठिकाणी पवित्र स्थानांचे ओटे आहेत. भिल्लममठ ही पवित्र वास्तू व श्रीचक्रधरस्वामींचे ‘महास्थान’ यांना वंदन करण्यासाठी भारतभरातून भक्त येतात.

चिंचोली (तालुका सिन्नर) हे गाव सेऊणचंद्र  – द्वितीय (शके ९७२ ते १००२) याने सर्वदेवाचार्य या राजगुरूस दान दिले होते. त्या दानाचे व चिंचोली गावाच्या चतुःसीमांचे वर्णन वसईचा ताम्रपट यात आलेले आहे.

‘सकलपरिग्रह विदितं सिंहिग्रामद्वादसके चिंचुली ग्रामः प्रदत्तः तस्य आघाटनानि पूर्विदग्भागे डोंगर दत्तं… दक्षिणे चिंचाला नाम तडागः।

नइऋत्ये वडगम्भाग्राम।

पश्चिमे तलेठिलीपर्यंतः उत्तरोत्तु सिंसि ग्रामीयडोंगर दत्तं तथा वटवृक्षर्चः’

वडगाव (पिंगळा, तालुका सिन्नर), शिंदे (तालुका जिल्हा नासिक) ही गावे चिंचोली गावाच्या भोवताली आहेत. ताम्रपटामुळे त्या गावांचेही प्राचीनत्व लक्षात येते.

यादवकाळापासून सिन्नरशी असलेले महानुभाव पंथाचे अनुबंध पुढेही टिकले. केशिराजबास यांनी लीळाचरित्रातील लीळांचे ‘रत्नमाळास्तोत्र’ या नावाने संस्कृतमध्ये काव्यरूपाने शके १२१० मध्ये वर्णन केले. मुरारीमल विद्वांस या आचार्यांची सिन्नर येथे एका गुजराती स्त्री भक्ताने शके १५०० मध्ये पूजा केली असे ‘वृद्धाचार’ या ग्रंथात वर्णन आलेले आहे.

श्रीचक्रधरस्वामींनी सिंघण, कृष्णदेवराय, महादेवराय, आमणदेव, रामदेव अशा पाच राजांची राजवट (शके ११४० ते ११९६) पाहिलेली आहे. स्वामींचा त्या राजांशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. कृष्णदेव (शके १९८०) व महादेव (शके ११८३) यानी तर स्वामींची आदरपूर्वक पूजा केलेली आहे. श्रीचक्रधरस्वामी व त्यांचा महानुभव पंथ अशा रीतीने यादवकाळाशी संबंधित आहे.

(अभ्यासाची साधने – लीळाचरित्र, स्थान पोथी, देवगिरीचे यादव – लेखक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे, प्राचीन मराटी कोरीव लेख – लेखक डॉ. शं.गो. तुळपुळे, महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास – डिखळकर)

लेख – बाळकृष्ण अंजनगावकर

माहिती साभार – खानदेश फेसबुक पेज

यादवकालीन खानदेश,यादवकालीन खानदेश,यादवकालीन खानदेश,यादवकालीन खानदेश

discovermh.com

सेऊणचंद्र द्वितीय | यादवकालीन खानदेश भाग ७ | Discover Maharashtra

Discover Maharashtra

सेऊणचंद्र द्वितीय | यादवकालीन खानदेश भाग ७ –

सेऊणचंद्र द्वितीयेचा वाघळी शिलालेखात एका मौर्यकूलप्रदीप गोविंदराजाचा उल्लेख आहे. त्याने सेउणचंद्र द्वितीयेला आपला महामंडलनाथ म्हटले आहे. कदाचित ह्या मौर्यकुलाला वेसूगिनेच  शासन करून यादवांचे अंकित केले असावे आणि याच पराक्रमाचा उल्लेख हेमाद्री यांनी,” संहृतप्रोद्धमुद्दामधामसामंत संतति: ” या ओळीने केला आहे. यानंतर भिल्लम चतुर्थ याचे नाव येते. त्याला हेमाद्रीने समरांगणातील भीम म्हटले आहे. पण त्याची फारशी माहिती उपलब्ध नाही.सेऊणचंद्र द्वितीय.

सेऊणचंद्र द्वितीय ह्याचे हेमाद्री प्रशासनात तसेच देवळाली ताम्रपट वसई येथील ताम्रपट आणि वाघळी येथील शिलालेख यात उल्लेख सापडतात. देवळाली ताम्रपटावर ग.ह. खरे यांनी, all Indian history Congress च्या १९५५ अधिवेशनात वाचला होता. हा ताम्रपट शके ९७४ चा असून त्यात सेऊणचंद्र द्वितीय याने  “देवलवल्ली” हा गाव आपला दंड नायक “श्रीधर” या दान  दिल्याचा उल्लेख आहे. हा सर्वात आधी उल्लेख आहे.  दुसरा उल्लेख आहे तो वाघळी येथील सिध्देश्वर मंदिरात असलेल्या शिलालेखात, वाघळी हे गाव खानदेशातील चाळीसगाव जवळ पूर्वेस सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि येथील एका शिवालयात शिलालेख कोरलेला आहे. संपादक डॉक्टर कीलहार्न यांनी तो वाचला आहे. यात  महामंडलनाथ सेउणचंद्र ह्याची प्रशस्ती व त्याचे सामंत कूल असलेल्या सौराष्ट्रातील वल्लभीवरून आलेल्या मौर्य घराण्याची वंशावळ दिली आहे. वसई ताम्रपट  वसई येथे सापडला, जो डॉक्टर भाऊ दाजी  यांनी बर्जेस यांच्याकडे दिला आणि तो भगवानलाल इंद्रजी यांनी इंडियन ॲंटीक्वेरी यात छापला आहे. सेऊणचंद्र द्वितीय विषयी राज्यप्रशस्तीतील श्लोक,

तत: समरमेदेनीपतिपतंगभंगव्रत:
प्रतापशिखिलंधितस्रिजगंगण: सेऊण:

असा आहे याचा अर्थ सेऊणचंद्राने अनेक राजांचा पराभव केला आणि त्याच्या पराक्रमास जणू तीनही  जगांचे अंगण उणे पडले.

तसेच वसई आणि आईरमदेवाच्या अश्वी ताम्रपटातील श्लोकात भिल्लम चतुर्थ नंतर यादव राजेवंशाला  दुर्दशेचे दिवस आले आणि पृथ्वीचा उद्धार करणाऱ्या महावराहाप्रमाणे सेऊणचंद्राने आपल्या राज्याचा  या आपत्तीतून उद्धार केला अशा अर्थाने आहे.

या दुर्दशेला कारणेही तशीच होती, कारण उत्तरेतील राजकारणात परमार विरुद्ध त्रिपुरीचा कर्ण कलचुरी आणि गुजरातचा चालुक्य भीम एकवटले आणि त्यांनी त्याचा पराभव करून थेट धारा नगरी पर्यंत चाल केली. मालव देश कलचुरी अश्वारोहिंनी उडवल्यावर या प्रांतात दक्षिणेत असलेल्या सेऊण प्रदेशावर त्यांची दृष्टी पडली आणि त्यात नाशिक जिल्ह्यातील काही भाग भोजाचा   उत्तराधिकारी यशोवर्मा यांच्या अधिकारात होता. हे त्याच्या कळवण ताम्रपटावरून लक्षात येते. कर्ण कल्चुरीच्या  रीवा शिलालेखात त्याने कुंतलपल्लव जिंकीत कांचीपुरम पर्यंत आपली विजय सेना नेली, असे वर्णन आहे. अर्थात ही अतिशयोक्ती आहे.

दक्षिणेत चालुक्य आणि चोल या़चा संघर्ष पराकोटीला पोचला होता. यात चालुक्यांच्या पराभव झाला आणि याचा फायदा कलचुरींनी घेतला. चालुक्य घराण्यातील भाऊ भाऊ  सोमेश्वर द्वितीय आणि विक्रमादित्य सहावा हे परस्परांविरूध्द ठाकले. सेऊणचंद्राने विक्रमादित्य सहावा याची बाजूला उभा राहिला. याचा उल्लेख हेमाद्री यांनी प्रशस्तीत केला आहे. त्यामुळे साहजिकच सोमेश्वर द्वितीय आहवमल्ल हा यादवावर चिडला. त्याच्या विचपल्ली जिल्हा मेहबूबनगर येथील शिलालेखात त्याने सेऊण राजाचा  पराभव केल्याचा उल्लेख येतो. तो म्हणजे सेऊणचंद्र द्वितीय असावा. तसेच त्याला विक्रमादित्य सहावा यांचेकडून भूप्रदेश ही मिळाला असावा.  नाशिकच्या पूर्वेस वाघळी सारख्या प्रदेशात सापडतात हे विशेष.

वाघळी शिलालेखात मौर्य कुलप्रदीप गोविंदराज हा स्वतःला सेउणचंद्र द्वितीय याचा सामंत म्हणतो, हे कुळ सौराष्ट्र प्रदेशातील वलभी येथून या गावात येऊन खानदेशात स्थायिक झाले होते हे दिसते. ते केव्हा खानदेशात आले हे मात्र कळत नाही,  पण हा शिलालेख महत्त्वाचा वाटतो; यावरून की या शिलालेखात  सापडणारी  मौर्य वंशावळ आणि त्यांची बावीस राजांचा उल्लेख आहे. वंशावळ जी सोम यापासून सुरू होऊन सर्वशूर ते गोविंद राजाची येते. या गोविंदराजाने वाघळी येथे सर्वांग सुंदर शिवालय निर्माण केले आणि त्याचे समोर जलपूर्ण वापी बांधली, या शिलालेखात या वास्तूचे खुप सुंदर वर्णन केले आहे ते असे,

सर्वैषां पार्थिवानां त्रिदिवपतिपुरारोहनि: श्रेणिभूतं,
गोविंदो भूमिपालत्स्वमलनृपगुणैरन्वित: कीर्तिकाम:।।

वापी चकार सुविमलोपलगाढबध्दा,
सोपानपंक्तिसुरवेश्मनिविष्टदेवा,
शंखोज्वलोर्मिवबहूशुभ्रजलप्रवाहा,
संस्नापिताभीशपनामधुनाशदक्षां।।

गोविंद राजाने देवाचे मंगल, भोग गंध, धूप, दीप तसेच शास्त्र, गीत, नृत्य यांचेसाठी नर्तिकांच्या उपजीविकेसाठी, ब्राम्हणांच्या भोजनासाठी अन्नछत्र चालावे म्हणून आणि वेदाभ्यास विद्वानांचे भोजनासाठी काही भुमी दिली तिचे वर्णन असे आहे, १.  वगलुकम्मत   भुमी:   याचे पूर्वेस  भंभि ( बहुतेक भामेर) व दक्षिणेस देवल क्षेत्र ( देवळाली) पश्चिम व उत्तरेला कारकगांव  याची ओळख पटत नाही. २. वखुली क्षेत्र याचे पूर्व पश्चिम-दक्षिणेला मार्ग कम्मत व सिद्धेश भूमी व उत्तरेला वह ३. वनकुटक भूमी: याचे पूर्व आणि उत्तरेला  नदी आणि दक्षिणेला वह  आणि पश्चिमेला ग्रामभू ४. पुर्वेला कार्पटिकाचे क्षेत्र, दक्षिणेकडे देवाचे शेत, पश्चिमेला ढोरे जाण्याचा मार्ग म्हणजे गोपथोवधी आणि उत्तरेला वटकूप म्हणजे वडाचे झाड आणि बारव. कम्मत हा नदीकाठचे गाळाचे शेतासाठी उपयोगी येणाऱ्या शब्द यादवकालीन अभिलेखात आणि महानुभाव साहित्यात वारंवार दिसतो तर वह किंवा वाही म्हणजे लहान नाला होय. ही दाने  सोळा विद्याभ्यासी पंडितांना गोविंदराजा व त्याची राणी नायकी यांनी दिली. वाघळी शिलालेखात गोविंद राजाची दान देण्याची तारीख २० जुलै १०६९ आणि १३ ऑगस्ट १०६९ ही आहे, या तिन्ही ताम्रशासनावरून सेऊणचंद्राचा काळ म्हणजे इसवी सन १०४८-१०७८ असा आहे. या शिलालेखातून आपल्याला खानदेशातील मांडलिक घराण्यांची म्हणजे खानदेशातील राज्यांची माहिती मिळते, हे मौर्य घराणे  कधी आले ? याबद्दल विशेष चर्चा नाही. परंतु पाटणे या परिसरात असलेले पितळखोरा लेणी आणि मौर्यांच्या पाटलीपुत्र राजधानी काळापासून येथे मौर्य होते का? की गुजरातच्या पाटणा वरून येथील प्रदेश पाटणे म्हणून ओळखला जाऊ लागला?  मौर्यांच्या राजधानी वरून पाटणे नाव असणे, यावरून या प्रदेशात मौर्य काळापासूनच मौर्य वंश लोक राहात असावेत असा अंदाज येऊ शकतो. हे मौर्य म्हणजे कोण? खानदेशातील मुळ लोक हे कोळी आणि भिल्ल होते यावरून साहजिकच माधांता हा जो मुळ पुरुष सांगितला जातो, याची सविस्तर चर्चा खानदेशाचा प्राचीन काळ यात करू या.

चर्चा –

सिध्देश्वर मंदिर  जे गोविंद राजाने  १०६९ मधील बांधले आहे. मंदीरातील शिलालेखातून कळते.  पत्नी मौर्य मांडलीक महामंडलनाथ सेऊणचंद्र यादव यांची मुलगी आहे. यांनी सभामंडप बांधण्यासाठी तर दान दिले आहे. तिथल्या वितानावर असलेला वेणूगोपाळ हा सील आणि नाण्यांवरही दिसतो. असाच वेणूगोपाळ हा लोणार येथील दैत्य सुदन मंदिरातील छतावर आहे.  ए.व्ही. नाईक यांनी ते शिलालेख वाचला आहे. जे सिध्देश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. (व्ही, व्ही, मिराशी.) वाघळी येथील सुर्यवंशी कुटुंब सिध्दनाथ नायकी विहिर प्रपा मौर्य राज्यांच्या नंतर बृहद्रथ घराणे सत्तेवर आले का? वाघळी लहान राज्यांतील गोविंदराजा निकुंभ राजा आहे का?  नाशिक जवळ सापडलेली नाणी जी चौथ्या शतकातील उत्तरार्थात आहेत. यावरून अहिर राजा मानसनृप ( Bombay gazetteer page 240) पुराणांमध्ये अहिर राज्य हे तापी आणि देवगड मध्ये आहे. हे पण अहिर आहेत का?

महामंडलेश्वर सेऊण याने मंदिर इ. स. १०६९ मध्ये बांधले असा शिलालेखात उल्लेख आहे. यादव राजा सेऊण याचा मौर्य मांडलिक गोविंद आणि त्याच्या पत्नीने हे मंदिर उभारले. खूप पडझड झाली आहे. तरीही मंडप सोडल्यास बाह्य भाग कळत नाही. मंडपाच्या तीनही बाजूंनी प्रवेशद्वार असावे. चांगदेव आणि चारठाणे येथील मंदिरासारखे असू शकेल. दुसऱ्या मुखमंडपाच्या विरूद्ध बाजूला गाभारा असणार. मंडपातील खांबावर दोन प्रकारचे शिर्ष आहे. मधल्या स्तंभांच्या शिर्षावर किचक, तर बाजूच्या खांबावर नागशीर्ष दिसते. मंडपाच्या छतावर कृष्ण आणि गोपींचे शिल्प आहे.

सेऊणचंद्र द्वितीय याचा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी परिसरात असलेल्या सिध्देश्वर मंदिर जे आता महानुभाव पंथाचे मठ आहे. तिथल्या शिलालेखाने बराच प्रकाश पडतो. याच मंदिराच्या आवारात चक्रधरस्वामींचा निवास घडला होता. लिळाचरित्रात वागुळीए वयति अशी नोंद आहे. लेखाचे वर्णन केले तर तो बराच मोठा ४२ ओळींचा आहे. भाषा संस्कृत लिपी दाक्षिणात्य वळणाची नागरी आहे. लेख पुर्ण पद्यात आहे. लेखाचे संपादन किलहॉर्न यांनी केले आहे. काळ इ. स. १०८० आहे. लेखात महामंडलनाथ सेऊणचंद्र याचा निर्देश आहे. हा भिल्लम चतुर्थ याचा पुत्र सेऊणचंद्र द्वितीय इ.स. १०५०-१०८० हा होय. याच नृपतीचा वसई ताम्रपट प्रसिध्द आहे तो इ. स. १०६९ मधील आहे. या लेखात सामंत गोविंदराज याचे वर्णन आणि वीस पुर्वजांची यादी येते. ती अशी, सोम, मांधात, कीकट, तक्षक, भीम, सर्वशूर, गोविंद राज प्रथम, साध्वासिक प्रथम, झंझराज, देवानासिन्, मुंज, पद्माकर, वापैय, वालपराज, साध्वासिक द्वितीय, शांतीराज, प्रवरसुकर, भाईलेक, भीमराज, गोविंदराज द्वितीय ही होय.

याच गोविंदराजाने हे मंदिर निर्माण केले आणि वापीही बांधली शिलालेखात वास्तूचे वर्णन सुंदर रितीने केले आहे.

वापी चकार सुविमल्लोपलगाढबध्दा।
सोपानपंक्तिसुरवेश्मनिविष्टदेवा।
शंखोज्वलोर्म्मिबहुशुभ्रजलप्रवाह।
संस्थापिताभिशमनामघनाश दक्षां।

गोविंद राजने हे दान त्याची राणी राजाई नायकी हीच्या सोबतीने दिली. यात संगमी आणि मधुवाटीका ही गावे, देवपुजेला मला, दिवाबत्ती साठी लाकडी  तेलघाणे, वाडा, इमान शेत भोग आणि गच्छकांना भूमी ब्राम्हण आणि विद्याभ्यास करण्यासाठी अन्नछत्र होय.  भुमीदानाचा तपशील दिला आहे. दुसरे महत्त्वाचे मंदिर म्हणजे महानुभावांचे कृष्ण मंदिर, जे सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. महानुभव यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी तेथे कृष्णाची मूर्ती स्थापन केली आणि ते मंदिर कृष्ण मंदिर किंवा महानुभव मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले. मंदिराच्या मोठ्या दगडांवर दुर्वाच्च अशी संस्कृत अक्षरे आहेत. मंदिराजवळच एक प्राचीन विहीर आहे. मंदिर सुमारे साडेचारशे वर्षापासून महानुभव यांच्या ताब्यात आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर यादव नृपती सेउनचंद्र द्वितीय याचा 11 व्या शतकातील देवनागरी लिपीतील संस्कृत शिलालेख आहे. त्याची तिथी आषाढ अमावस्या सूर्यग्रहण म्हणजे साधारण इसवीसनाच्या १०६९ ही आहे.

ह्या लेखाचा सारांश खालील प्रमाणे आहे. गोविंदराजा मौर्य यादव नृपती येऊन याचा मांडलिक याने हा लेख असलेले मंदीर बांधले आणि त्यास बऱ्याच देणग्या दिल्या. शिवाय यादव नृपती सेऊणचंद्र याने सिद्धेश्वराच्या मंदीराला संगमी व मधुवाटिका ही गावे दान दिले. हा लेख तीन दगडावर तीन भागात आहे. तथापि तिन्ही भाग मिळून एकच लेख असल्याचे स्पष्ट आहे. या लेखात माधांता, यादवांचा मांडलिक मौर्य कुळाचा मूळपुरुष तसेच मौर्य वंशावळीतील किकट, तक्षक, भीम, सर्व शूर, गोविंद, साध्वासिक, झंझ, देवहस्ती, मुंज, पद्माकर, बप्पैय, बालपराज, साध्यसिक, शांतीराज,  प्रवरसुकर, भैलेक,  भीमराज, गोविंदराज, म्हणजे या मंदिर बांधणारा आणि दान देणारा होय तर नायकी जी मंदिर बांधण्यात सहभागी झालेली गोविंद राजाची राणी, सेऊणचंद्रद्वितीय  दान देणारा देवगिरीचा यादव नृपती  या व्यक्तींनामांचा  आणि वल्लभी सौराष्ट्रातील गाव संगमी मधू वाटिका आणि कारकग्राम या ग्राम नावांचा समावेश आहे.

सध्या हे मंदिर भग्न अवस्थेत असल्यामुळे मूळ विन्यासाची कल्पना येत नाही. तीन बाजूला कक्षासन असलेल्या मंडपाचा मंदिराचा मंडप वेगळा मोकळा वाटतो. मंदिराची खास विशेषता येथील स्तंभांची दोन प्रकारे शिर्षे होत. मंदिरातील मध्यभागी असलेल्या चार स्तंभांची सशिर्ष दोन आमलकात विभागले आहेत. वरच्या बाजूला चौरसाकृती पट्टिकांची योजना केली असून चारही कोपऱ्यांवर वेल सरी आहेत. प्रतीक आमलकात किचकाकृती  म्हणजे भारवाहक यक्ष कोरलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे स्तंभ महाराष्ट्रातील चारठाणा येथील भवानी मंदिरात जे मुक्ताईनगरच्या येथील मंदिरात दिसतात. त्या मंदिराचे गर्भगृह आणि सरी कोरलेल्या आहेत. त्यावर गोलाकृती नागफण्यांचे काठ असलेल्या स्तंभाधार सरी कोरलेल्या आहेत.

सर्वात विशेष म्हणजे या मंदिराचे छत नाविन्यपूर्ण आणि कलात्मक आहे. अशा प्रकारचे नाशिक जिल्ह्यातील देवळाली तसेच लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात गोलाकार छतामध्ये श्रीकृष्ण बासरी वाजवत असून त्याभोवती नृत्यतल्लीन आठ गोपिका दाखवलेल्या आहे. कृष्ण मंदिराला लागूनच एक भुयार आहे.

वाघळी गावात एका ओट्यावर गणेशाची मूर्ती असून कुठल्यातरी मंदिराच्या प्रवेशद्वाराचा दगडी महिरपीचा भाग  आहे, ती म्हणजे गणेश मंदिराचा भाग असावा असे लोक म्हणतात. यादव काळातील स्थानिक राजे शिव मंदिरे बांधण्यास उत्तेजन देत असे दिसते. संस्कृत भाषा तेव्हा प्रचलित होती.

सिध्देश्वर मंदिर, वाघळी

  • संदर्भ: शं. गो.तुळपुळे, प्राचीन मराठी कोरीव लेख
  • ब्रम्हानंद देशपांडे, देवगिरीचे यादव
  • भांडारकर, अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन.

@ सरला

कान्हादेश मधील आमळी | Discover Maharashtra

Discover Maharashtra

कान्हादेश मधील आमळी –

धुळे, नंदूरबार हे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे काही पर्यटनासाठी फारसे प्रसिद्ध नाहीत. पण याच जिल्ह्य़ांच्या अंतर्गत भागात आमळी, अलालदरीसारखी काही नयनरम्य ठिकाणंदेखील दडलेली आहेत. महाराष्ट्राचे पश्चिम टोक म्हणजे धुळे, नंदूरबार. नंदुरबार हा धुळ्यापासूनच वेगळा झालेला जिल्हा. धुळे शहराची काही वैशिष्टय़े आहेत. जसे की नगररचना. चौकोनी गल्ल्यांचे शहर आहे हे. इथल्या सात जुन्या आणि सहा नंतर वाढलेल्या अशा तेरा गल्ल्या पायीच फिरायला हव्यात. धुळ्यात समर्थ वाग्देवता मंदिर आणि राजवाडे वस्तुसंग्रहालय अशा दोन महत्त्वाच्या वास्तू आहेत. एकविरा देवीचे मंदिर गावात आहे. धुळ्याच्या पांझरा नदीला क्वचितच पाणी असते. उन्हाळ्यात ऊन प्रचंड असते. पण तरीही धुळ्याच्या पश्चिम टोकाला भात मोठय़ा प्रमाणात पिकवला जातो. धुळ्याचे पश्चिम टोक म्हणजे साक्री तालुक्यातील कोंडाईबारीजवळचा भाग. धुळे-साक्री-दहिवेल माग्रे कोंडाईबारीकडे जाता येते. दहिवेल फाटय़ापासून पाच एक किलोमीटरवर कोंडाईबारी येते. कोंडाईबारीकडून आमळी गावाकडे जायचा फाटा लागतो. कोडाईबारी हा खरे तर जंगल आणि घाट परिसर आहे. आमळी फाटय़ाला वळलो तरी डोंगर परिसराचा आनंद घेत पुढे जाता येते. सगळा आदिवासी परिसर आहे. शांत आणि नयनरम्य असा हवेशीर प्रदेश.

कोंडाईबारीहून तेरा किलोमीटरवर आमळी आहे. धुळ्यापासून आमळी गाव साधारण नव्वद किलोमीटर दूर आहे. कोंडाईबारी आमळी रस्त्याला लागून वनविभागाची मालनगाव रोपवाटिका लागते. अतिशय लोभस परिसर आहे हा. वळणावळणाचा रस्ता आणि काबऱ्याखडक धरणाचा भाग हे इथले वैशिष्ट्य. धनेर, जांभाळी, उंबरीपाडा, भोरटीपाडा पार करून आमळी गाव लागते. इथे भिल्ल आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. आमळी गाव कन्हैयालाल महाराजांच्या मंदिरासाठी नावाजलेले आहे. नावात जरी कन्हैया असले, तरी हे कृष्णाचे मंदिर नाही. महाराज असा जरी शब्द असला, तरी हे कोणी महाराजदेखील नाहीत. इथे निद्रावस्थेतील विष्णूची पुरातन मूर्ती आहे. या मूर्तीच्या बेंबीतून पाणी वाहत असते, असे मानले जाते. काही जण सांगतात, हा विशिष्ट प्रकारचा खडक आहे. हवेतील आद्र्रता शोषून पाणी बाहेर येत असावे. त्याबद्दल परिसरात अनेक गमती जमती ऐकायला मिळतात.(कान्हादेश मधील आमळी)

या मूर्तीची छोटीशी आख्यायिका मंदिरात लावलेली आहे. त्यानुसार सौराष्ट्रातील डाकोर येथील एका हरिभक्तावर प्रसन्न होऊन हरीची मूर्ती स्वतहून डाकोर येथे प्रकट झाली. त्यानंतर अनेक वर्षांनी मुल्हेरच्या राजांना श्रीहरीने स्वप्नात येऊन ती मूर्ती डाकोर येथून कुठेही खाली न ठेवता आणायला सांगितले. त्यांनी डाकोर येथे जाऊन एका तळ्यातूनती मूर्ती काढली आणि डोंगरदऱ्यांच्या मार्गाने आमळी गावात विश्रांतीसाठी थांबले. मूर्तीची पालखी जमिनीला लागू नये म्हणून झाडाला बांधून ठेवण्यात आली होती. पण विश्रांती झाल्यावर पाहतात, तर मूर्ती जमिनीला टेकली होती. घोडे, हत्ती लावूनही मूर्ती जागची हलली नाही. हरीची इच्छा म्हणून मूर्ती तिथेच ठेवून ते निघून गेले. अनेक वर्षांनी तिच्यावर मुंग्यांचे वारूळ आणि टेकडीसारखा भाग तयार झाला. एका दुष्काळात पावबा नावाचे हरिभक्त डांग येथे जात असताना त्यांना आमळी परिसरात पाण्याचा सुगावा लागला. ते तिथेच थांबले. त्यांच्याही स्वप्नात मूर्तीविषयी दृष्टांत झाला. त्यांनी टेकडीखालून मूर्ती काढली. समोरच्या धनसरा डोंगरावरून जो दगड काढशील, त्याच्या खाली मंदिरासाठी पसे मिळतील, असाही दृष्टांत त्यांना झाला. त्यातून हे मंदिर साकारले, अशी अख्यायिका आहे. १६१४ साली हे मंदिर बांधून पूर्ण झाले. मूर्ती त्याआधी कित्येक वर्षांपासून आहे. साधारण हजार एक वर्षांचा मूर्ती विषयक इतिहास इथली मंडळी सांगतात. अर्थातच याला थेट पुरावा काही नसल्यामुळे पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून याचा नीट अभ्यास व्हायला हवा.

मुख्य मंदिराच्या समोरील बाजूने पाच-सात छोटी छोटी मंदिरे आहेत. मंदिर परिसर फारच छान आहे. तेथे इच्छापूर्ती दगडही आहे. हा दगड उभाच्या उभा उचलून बघायची गंमत आहे. उभा उचलला गेला, तरच मनातली इच्छा पुरी होते, असे श्रद्धाळू मानतात. मंदिराच्या एका बाजूला अतिशय जुने चाफ्याचे झाड आहे. या चाफ्याचे फूल एका तिथीला बरोबर मूर्तीच्या पायाशी पडत असे, मानले जाते. आमळी गावात एक फेरी मारता येते. इथे खुशबू आणि इंद्रायणी असा दोन प्रकारचा तांदूळ विकला जातो. इथले माप ‘चंपा’ हे आहे. चंपा म्हणजे साडेतीन किलो. सात किलो म्हणजे एक पायली किंवा दोन चंपे.

आमळी गावापासून दोन-अडीच किलोमीटरवर अलालदरी धबधबा आहे. समुद्रसपाटीपासून हा भाग १८६० फूट उंच आहे, असे इथे फलकावर लिहिलेले आहे. परिसरात मोहाची अनेक झाडे आहेत. अलालदरी धबधबा परिसर पावसाळ्यात नयनरम्य दिसतो. विशिष्ट डोंगररचनेत मोठी दरी निर्माण झालेली आहे. त्यात अनेक धबधबे पावसाळ्यात तयार होतात. कन्हैयालाल धबधबा, मत्स्या धबधबा आणि जांभाळी धबधबा हे इथले खास आहेत. वन विभागाच्या तीन-चार चौक्या इथे बांधण्यात आलेल्या आहेत. दरीत खाली उतरणे धोकादायक आहे.

इथले आदिवासी मात्र दरीत जाऊ शकतात. या दरीतून कमीत कमी वेळात ते नवापूर गाठत असत, असे स्थानिक सांगतात. इथे भिल्ल आदिवासी जास्त दिसतात. आमळी गावाच्याच वाटेने वार्सीमोर्ग शबरीधाम या नयनरम्य परिसराकडे जाता येते. इथे शक्यतो दिवसा प्रवास करावा. कोंडाईबारीपासून नवापूर ४० किलोमीटर आहे. सापुतारामार्गेदेखील शबरीधामकडे जाता येते. धुळे जिल्ह्यात पर्यटनाची ठिकाणे फार कमी आहेत, पण आमळीसारखी ठिकाणे एकाच वेळी निसर्गाचा आणि इतिहासाचा ठेवा उदरात घेऊन नांदताना दिसतात. त्यांना कधी तरी भेट द्यायलाच हवी.कान्हादेश मधील आमळी.

प्राची पाठक


सफर:-" मेवाड़ से खानदेश तक ....".--ठा . जयपालसिंह गिरासे [सिसोदिया],शिरपूर




इ.स.१३०३  का समय : भारतवर्ष का मुकुटमणि दुर्गराज चित्तोड़ विदेशी आक्रांता अलाउद्दीन ख़िलजी के आक्रमण से झुंज रहा था। गढ़ के नीचे ख़िलजी ने जुल्म के कहर ढहाये हुए थे। परिणामत: युद्ध अटल था। महाराणी पद्मिनी ने १३००० स्रियों के साथ जौहर ज्वाला मे अपने आप को समर्पित कर दिया। जौहर ज्वाला मे जलती सतियों की कसम खाकर मेवाड़ के विरो ने  केसरिया धारण कर दुर्ग के किवाड़ खोल दिये और ख़िलजी की सेना पर भूंखे शेरों की तरह टूट पड़े। भीषण युद्ध हुवा। आत्मगौरव की रक्षा के लिये क्षत्रियो ने लहू की होली खेली। देखते देखते अपनी आन-बाण एवं शान की रक्षा के लिये मेवाड़ के वीर बलिवेदी पर चढ़ गये। गढ़ के बाहर कस्बो मे या जागीरों मे जो राजपूत बचे थे वे अपने धर्म तथा स्वाभिमान को बचने के लिये अन्यत्र सुरक्षित स्थानों पर निकल गये। इन्ही बचे हुए क्षत्रियों के २४ कुल रावल अभयसिंहजी के नेतृत्व मे मांडू की ओर चले गये। उन्हीं के सुपुत्र रावल अजयसिंहजी ने दौडाइचा मे अमरावती नदी के किनारे सं १३३३ मे अपनी जागीर कायम की. वहा उन्होने एक छोटासा किला  भी बनवाया जिसे स्थानिक लोग गढी कह कर पुकारते  है। उन्हे दो पुत्र थे। झुंजारसिंह और बलबहादूर सिंह। ई स १४५५ मे छोटे पुत्र बलबहादूरसिंह ने मालपुर मे दरबारगढ़ नामक किला बनवाया और वहा अपना स्वतंत्रराज स्थापित किया। दौडाइचा सरकार की हुकूमत ५२ गावों मे थी। मालपुर के रावल सरकार की हुकूमत भम्भागिरि [भामेर] तक थी। मालपुर मे जा बसे सिसोदिया परिवार के लोगोने १३ गाव बसाये जिनमे वैन्दाना; सुराय ;रामी; पथारे; वणी;धावड़े ;खर्दे आदि गाव प्रमुख थे.....इन्ही गावों मे से कई परिवार ओसर्ली;कोपरली; टाक़रखेड़ा;वाठोडा ;अहिल्यापुर ; पलाशनेर; होलनांथा; भवाले; विरवाडे आदि गावों मे बस गये। वहा उन्होने खेती और जमींदारी की वृद्धि की। 

      सूरत विजय के बाद लौट रहे छत्रपति शिवाजी  महाराज की फ़ौज का स्वागत दरबारगढ़ नरेश रावल रामसिंहजी ने किया था। औरंगज़ेब की मृत्यु के बाद दक्षिण मे लौटते युवराज शाहू महाराज और रानी येसुबाई जी को दक्षिण मे सुरक्षित पहुचाने की जिम्मेदारी मालपुर दरबारगढ़ के रावल सरकार ने उठाई थी। जिन्हे छत्रपति शाहूजी ने कोल्हापुर दरबार मे बुलाकर सन्मानित किया था और सनद बहाल की थी। शाहआलम के वक़्त भी लामकानी के रावल मोहन सिंह ने मुघलों से लोहा लिया था और खानदेश से मुघल टुकड़ियों को भगाया था।

     इसी काल मे दुर्जनसिंह रावल [जो महालकरी थे उन्हे महाला कहा  जाता था ] ने बुराई नदी के किनारे धावा बोला। वहा के कोली शासक को परास्त कर वहा अपना शासन शुरू किया। वहा नदी के किनारे विजयगढ़ नामक गढी बनाई और पाटन नाम का गाव बसाया। जहा मा आशापुरा का प्रसिद्ध मंदिर है।  इनकी ५५ गावों मे जहागीर थी और वंशविस्तार हुवा। जिनमे शिन्दखेड़ा; आलने;खलाने ;चिमठाने; दरने; रोहाणे ; तावखेड़ा; अमराला ; देगाव; लामकानी; कढरे; रामी; बलसाने ; वरुल ; घुसरे; शेवाले ; धूरखेड़ा आदि प्रमुख है।  

    १३३२ मे चावंडिया राजपूत अमरसिंह ने सातपुड़ा के घने जंगलों मे स्थित प्राचीन स्थल तोरणमाल पर कब्जा किया। महाभारत के समय यहा के राजा युवनाक्ष ने पांडवो की ओर से युद्ध मे हिस्सा लिया था और विजनवास के समय पांडवो ने यहा कुछ समय बिताया भी था। इसी वंश के रावल फतेहसिंह ने मांजरा नाम के ग्राम की स्थापना की और १३ गावों मे बस्ती बसाई। उसी काल मे सोलंखी सरदार [जो इशी नाम से जाने जाते थे] रावल सुजानसिंह ने अपनी सेना द्वारा सुवर्णगिरि पर हमला किया और वहा अपना शासन आरंभ किया। उन्ही के वंशज केसरीसिंह के बेटे मोहनसिंह ने तोरखेड़ा गढ़ी की स्थापना की और लगभग २२५ गावों मे अपना वर्चस्व स्थापित किया। उन्होने ही कोंढावल गाव बसाकर वहा एक क़िलेनुमा कोट बनवाया।  इनके परिवार के लोग तरहाड; भटाने; रंजाने; धमाने; विरदेल; बिलाडी;जसाने; कमखेड़ा ; आछी; कोटली ;हिसपुर; तावखेड़ा; डोंगरगाव आदि गावों मे जा बसे।  इसी वंश के धवलसिंह के पुत्र मदनसिंह ने  स्थानीय शासक सोना कोली को परास्त कर  कोडिड के जंगलों मे अपनी गढ़ी बनाई। कोडिड; वणावल; उपरपिंड; रुदावली; गिधाडे; आरावे; वाडी आदि गावों मे अपना वतन बनाया। इसी परिवार के विजयसिंह नांदरखेड़ा मे गये। जिनके वंशज कनकसिंह ने लांबोला गाव मे अपनी जागीर की स्थापना की। १३३२ के मध्य मे तंवर परिवार के रावल संग्रामसिंह ने नंदुरबार पर हमला किया और वहा के गवली शासक को परास्त कर अपना शासन कायम किया। उन्ही के वंशज जयसिंह ने भोंगरा गाव बसाकर सारंगखेडा [तापी के किनारे] मे अपनी जागीर की स्थापना की। जिनका सारंगखेडा;असलोद्; गोगापुर तक विस्तार रहा। 

   करौली के जादौन परिवार भी मेवाड़ की सेवा मे थे। वे भी अपने साथियों के साथ दक्षिण की ओर निकले। सूरतसिंह जादौन के वंशज विजयसिंह ने वर्तमान महाराष्ट्र और मध्य प्रदेश की सीमा पर स्थित सातपुड़ा की तलहटी मे पलासनेर नाम के गाव की स्थापना की।वहा उन्होने अपनी गढ़ी बनाई। पलाश वृक्ष का घना जंगल होने की वजह से उसका नाम पलासनेर हुवा। वहा से एक परिवार बभलाज़ मे जा बसा और वहा अपनी जागीर स्थापित की। उन्ही के वंशजो ने १६५२ मे सूर्यकान्या तापी नदी के किनारे थालनेर गाव मे जागीर प्राप्त की।  थालनेर फारूकी राज्य की राजधानी रही थी।  वहा उन्हे जामदार का किताब दिया गया।  वहा से कुछ्  परिवारोने १७०२ मे आमोदा गाव की स्थापना की। वहा उन्हे मराठा शासन काल मे देशमुख पदवी प्राप्त हुई। यहा से खानदेश के ३२ गावों मे जादौन परिवार जा बसे जिनमे तंवर की वडली; विकवेल; जैतपुर; पिंपरी; विरवादे; होलनांथा; हुम्बरडे; मलाने; भोरखेड़ा ;पथारे; रामी; सावलदा आदि प्रमुख गाव है।

    मालवा से कुछ परमार परिवार भी खानदेश मे आ बसे। वे मांडू--धार होकर तापी के किनारे शेंदनी नाम के ग्राम की स्थापना की जहा क़िलेनुमा दो बड़ी हवेलिया बनवाई। यहा से कुछ परिवार भोरख़ेड़ा और भावेर गाव मे जा बसे जिनके कुछ वंशज होलनांथा और पथारे गाव मे बस गये। इन प्रमुख घरानों के साथ तंवर परिवार भी खानदेश की ओर आकृष्ट हुये। जिन्होने वडली नाम का  गाव बसाया। होलकर शासन के समय महारानी अहिल्या देवी ने  अहिल्यापुर नाम का गाव बसाया और वहा का जिम्मा वडली के तंवर परिवार को सौपा गया। कुछ तंवर बागलान की ओर जा बसे। मालेगाव के पास कुछ गावों मे तंवर राजपूत बस्ते है। मेवाड़ से खानदेश मे आये निकुम्भ राजपुतोने शहादा तहसील मे पांच गाव बसाये.....येंडाइत परिवारो ने जलगाव  जिले मे नगरदेवला; चिचखेड़ा  आदि पांच गावों मे बस्ती बसाई। चौहानो ने भी धामनोड ,निवाली के परिसर मे अपनी बस्ती बसाई[जो वर्तमान म प्र मे है]।  बागुल बेटावद मे जा बसे। कुंडाने , हारेश्वर पिंपलगाव मे बघेल जा बसे जो आज वाघ नाम से जाने जाते है। मौर्य कुल के ४ गाव नांदरखेड़ा के साथ साथ बसाये गये। सूर्यवंशियो ने जावदा ग्राम बसवाया। सनेर वाघाला मे ; रावा मेहरगाव मे ; गांगुला चालीसगाव  और तांदूळवाड़ी में ; सिंगा सजदा में  बसे। कुछ सिसोदिया परिवार जलगाव जिले के यावल में बसे जहाँ उन्होंने छोटी सी गढ़ी भी बनवाई थी! मराठा शासन के उत्तरकाल में पेशवा के एक सरदार ने उनके वतन को छीन लिया था !

    मेवाड़ के सिसोदिया राजवंश से एक राजकुमार ने मध्ययुगीन काल में वर्तमान बड़वानी राज्य  की स्थापना की थी।  और उस राज्य की सीमा भी दक्षिण में खानदेश तक थी। इस काल में मुस्लिम आक्रमण की वजह से भी इस प्रदेश से कई परिवार विस्थापित  होकर निमाड़ ; खानदेश; विदर्भ आदि क्षेत्रों में चले गए थे। 

   आज के बुरहानपुर के निकट स्थित आसिर गढ़ पर मेवाड़ से पधारे  चौहानों का वर्चस्व था। ख़िलजी के आक्रमण बाद चित्त्तोड़ से ही पधारे हुए शूरवीर टांक पंवार राजपूतो ने अपना वर्चस्व स्थापित कर दिया था। जब चित्तोड़ पर आक्रमण होते थे तब टांक पंवार राजपूतो ने अपनी वीरता का अनुपम परिचय दिया था। ख़िलजी के आक्रमण के बाद टांक पंवार मेवाड़ से निकलकर मालवा, खानदेश, निमाड़ आदि क्षेत्रों मे चले गये थे। इन्ही के कुछ वंशजो ने ऐतिहासिक मराठा-अब्दाली पानीपत युद्ध मे भी हिस्सा लिया था। 

ख़िलजी के दक्षिण आक्रमण के बाद आसीरगढ़ का क़िला पंवारों के हाथों से छीन लिया गया था। 

ख़िलजी के गुजरात आक्रमण के वक़्त राजा करनदेव वाघेला दक्षिण मे देवगिरि की शरण मे आया। लेकिन राजा रामदेव राय की हार के बाद और उसे ख़िलजी द्वारा गुजरात मे एक जागीर बहाल किये जाने के बाद करनदेव वाघेला अपने अनुचरों के साथ महाराष्ट्रा के बाग़लन;खानदेश तथा सातपुड़ा के तटवर्ती इलाखों मे बस गये थे। अकबर के आक्रमण के वक़्त खानदेश के स्थानीय शासकों को अपनी ओर मिला दिया जाये और उनकी सेवाये ली जाये ऐसा फरमान उसने निकला था लेकिन खानदेश के स्थानीय निवासियों ने कोई प्रतिसाद नहीं दिया। खानदेश के शासक ज्यादा सुरक्षित इसलिये थे क्योंकि उत्तर से दक्षिण की ओर जाने वाले मार्गों पर उनका नियंत्रण था तथा यहा की प्राकृतिक व्यवस्था उनका बचाव करने मे पूर्णता: सक्षम थी।
   खानदेश प्रांत को साड़े बारा रावलों का वतन भी कहा जाता है। बारा पूर्ण तथा एक आधे ठिकाने का समावेश इसमे होता था। 
खानदेश के साड़े बारा ठिकाने निम्ननिर्दिष्ट सुचीनुसार है :-
१] दोंडाईचा २] मालपुर ३] शिन्दखेड़ा ४]  आष्टे ५]सारंगखेडा ६] रंजाने ७] लांबोला ८] लामकानी ९] चौगाव १०] हाटमोहिदा ११] वनावल १२] मांज़रे १३] करवंद [आधा वतन खानदेश मे था और आधा खानदेश के बाहर] 

   ज्यादातर बैस ; बडगुजर ; गौड़ ;भारद्वाज ; सोलंखी; खींची राजपूत महाराजा छत्रसाल के समय में दक्षिण तथा मध्य महाराष्ट्र में स्थायी रूप  से निवास करने लगे थे। वे मालवा --बुंदेलखंड --विदर्भ होते हुए दक्षिण भारत तक का सफर कर आये थे। वे संघटित रूप में रहते थे।  ऐतिहासिक खर्डा  युद्ध में उन्होंने मराठा पक्ष  का साथ देकर हैदराबाद निजाम के खिलाफ मोर्चा संभालकर बहादुरी दिखाई थी। इनके कई वंशज पुणे ; कोंकण; बीड ; नांदेड ;उस्मानाबाद   क्षेत्र में है।  वीर बन्दा  बहादुर के साथ कुछ राजपूत नांदेड के प्रान्त में आये थे।  वे यही बस गए थे। विदर्भ में गाविलगढ़ की किलेदारी भी किसी राजपूत के पास थी।  तो कुछ उत्तर भारत के राजपूत मुग़ल आक्रमण के वक़्त दक्षिण की और आकर यही बस गए थे। जो ज्यादातर विदर्भ; मध्य  तथा दक्षिण महाराष्ट्र में स्थायी हुए।  उन्हें स्थानीय निवासी परदेशी कह पुकारते थे।  मांडू के कुछ परमार चावंडिया परिवारों के साथ खानदेश मे आये थे उनमे से एक परिवार ने प्रतापपुर नाम की छोटी जागीर बनाई। राणा उनकी उपाधी रही। वडली  के तंवरो ने होल्कर स्टेट का खजाना लूटा था।
 कुछ परिवार गुजरात में स्थित सिद्धपुर , धर्मपुर ,वांसदा तथा मालवा स्थित बरवानी स्टेट से स्थानांतरीत होकर महाराष्ट्र कि भूमी में बस गए थे …. 
  मेवाड़ के वंश से श्री चन्‍द्रकिरण जी जिन्होने युवा अवस्था  मे ही सन्यास ग्रहण कर लिया था ; जलगाव के पास कानलदा नाम के गाव मे आये जहा कण्व ऋषि का प्राचीन आश्रम था। स्वामी श्री चन्द्रकिरणजी तपोवनमजी ने उस आश्रम का जीर्णोद्धार किया और वही सन्यस्त जीवन बिताया था।

  आजादी के आंदोलन मे खानदेश के राजपूतो ने बढ़-चढकर हिस्सा लिया था। महात्मा गाँधीजी तथा विर सावरकरजी ने मालपुर के दरबारगढ़ को भेट दी थी। टाकरखेड़ा के गुलाबसिंह भिलेसिंह सिसोदिया हिन्दू महासभा के प्रतिनिधि के रूप मे अंग्रेज़ कॅबिनेट मे चुनकर आये थे। जो सावरकर के खास साथी थे।   सुराय के पद्मसिंह सिसोदिया हेडगेवारजी तथा गोलवलकर गुरुजी के नजदीकी थे। सन १९३६ में महाराष्ट्र के फैजपूर में कॉंग्रेस का ऐतिहासिक अधिवेशन संपन्न हुवा था जिसमे पंडित जवाहरलाल नेहरूजी , महात्मा गांधीजी सहित देश के गणमान्य अथितियो ने शिरकत कि थी ----बारीश हो रही थी और ध्वजारोहण के मौके पर ध्वज अटक गया था ---कई लोगो ने ध्वज स्तंभ पर चढने का प्रयास भी किया लेकिन उनके सारे प्रयास व्यर्थ साबित हुए ---उस वक्त शिरपूर के एक राजपूत युवक ने जिन्हे बंदा पाटील कहकर पुकारते थे ---ध्वज स्तंभ पर चढाई कर ध्वज कि गांठ को मुक्त कराया ---सारा माहोल अचंभित हो गया था उनके साहस को देखकर ---खुद पंडित जी ने उनका सन्मान किया था ---.राजपूतो ने गाव तथा खेती ,व्यापार का विकास किया। अपने साथ कई जातियों का वे सहारा बने थे। स्वर्गीय सोनुसिंहजी धनसिंहजी भूतपूर्व केन्द्रीय गृहराज्यमंत्री थे। श्रीमती प्रतिभाताई पाटील जी ने तो देश का सर्वोच्च स्थान महामहिम राष्ट्रपति के रूप मे प्राप्त किया था। दोंडाइचा के भूतपूर्व संस्थानिक तथा विधायक दिवंगत श्रीमान जयसिंहजी रावल साहब ने आशिया का पहला स्टार्च प्रॉजेक्ट शुरू किया जो हजारो लोगोंको  आजभी रोजगार दे रहा है। उन्होने  यहा स्कूल; उद्योग शुरू किये और लोगों को रोजगार दिलवाये। आपके पुत्र श्रीमान बापूसाहेब जयदेवसिंहजी भी विधायक रहे तथा पोते कुंवर जयकुमार रावल विद्यमान भाजपा सेना सरकार में कैबिनेट मंत्री है जिन्हें पर्यटन, रोजगार मंत्रालय की जिम्मेदारी सौपी गयी है। स्व.इन्द्रसिंहजी सिसोदिया  तीन बार विधायक रहे। शिवसेना के आर.ओ तात्या ; जनता दल महेन्द्रसिंहजी;  कॉंग्रेस के दिलीपकुमार सानंदा भी विधायक रहे थे।  पाचोरा से श्री आर ओ पाटिल शिवसेना के विधायक थे ! अब की बार पाचोरा से उन्ही के भतीजे शिवसेना के श्री किशोरसिंह पाटील  भी वर्तमान विधायक है। उत्तमसिंह पंवार सांसद रह चुके है। नंदुरबार के श्री बटेसिंहजी तथा उनके सुपुत्र श्री चन्द्रकांतजी रघुवंशी महाराष्ट्र विधान परिषद के दो बार सदस्य रहे। कई भाई -बहन सरपंच ,पार्षद , नगराध्यक्ष ,जिला परिषद सदस्य , विभिन्न स्थानिक स्वराज्य संस्थाओ मे पदाधिकारी के रूप मे भी मौजूदगी बरकरार है …। 



खान्देश प्रदेश में ज्यादातर राजपूत ''गिरासे'' टाइटल का प्रयोग करते है। जिन्हे शासक द्वारा जमीन प्रदान की जाती थी और गिरासदार अपने क्षेत्र के  कुनबियों  द्वारा खेती किया करते थे वे गरासदार मतलब गिरासे कहलाये जाते थे। फारुकी ;मराठा; होलकर ;पेशवा आदि शासन समय में कुछ जादौन परिवारों को देशमुख; पाटिल; चौधरी; जामदार आदि खिताब प्रदान किये गए थे और उन्हें प्रांतीय तथा ग्रामीण प्रशासन में महत्वपूर्ण अंग माना  गया था। राज बदलते थे --तख़्त पलटते थे लेकिन इनके अधिकार को किसीने नहीं छिना। दिल्ली की ओर से या गुजरात की ओर से जब दक्षिण की और बड़े आक्रमण होते थे तब खान्देश  कि जनता को  काफी कष्ट झेलने पड़ते थे।  ऐसे कठिन समय में वे अपने परिवार तथा प्रजा के साथ सुरक्षित जंगलो में  चले जाते थे। कई राजपूत अपने भाईयों से बिछड़ गए वे सुदूर महाराष्ट्र के दक्षिण  कि ओर  चले गए। अपने गाँव ;स्वभाव ;मूलपुरुष के नामों  पर उनके परिवार पहचाने लगे।  

मध्य युग के इस संक्रमण काल में इस शूरवीर प्रजाति ने काफी संकटों का सामना  किया। उन्हें कई बार अपनी बस्तिया उजाड़कर नयी बस्तियों  का निर्माण करना पड़ा था.…। कई बार स्थलांतरित होना  पड़ा था। घने पहाड़ों का सहारा लेकर इन्होने अपने धर्म तथा वंश  को सुरक्षित रखा। इनके साथ अन्य जाती और जनजाति के लोग भी आये थे। उनकी सुरक्षा का जिम्मा भी इन परिवारों उठाया था।  अंग्रेज के वक़्त बार उपेक्षा भी झेलनी पड़ी थी। अकाल के समय में अंग्रेज हुकूमत द्वारा लगान जब जबरन वसूल की जाती थी तब दोनों पक्ष में संघर्ष अटल होता रहा था। कई बार बार अंग्रेज सरकार का खजाना लूट लिया जाता था या उनकी टुकड़ियों पर हमले  भी किये जाते थे। तब राजपूत को तथा तत्सम जनजातियों के लोगों को  अंग्रेज सरकार काफी तकलीफ भी देती थी।  बागियों को प्रताडा जाता था।  कई बार स्थानीय शासकों की वजह से ; अकाल; भुखमरी; पानी की किल्लत; सुरक्षा आदि कारणों से उन्हें विस्थापित भी होना पड़ा था।  समाज के  चुनिंदा लोगों के पास धन तथा बल था लेकिन बहुत बड़ा वर्ग काफी कष्टमय जीवन बिताता था।  

{C} लेखक: श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे [सिसोदिया] मूल ग्राम: वाठोडा 

पता : प्लॉट नं :५०; विद्याविहार कॉलोनी; शिरपुर जि: धुले [महाराष्ट्र]

संपर्क: ०९४२२७८८७४० 
ईमेल :jaypalg@gmail.com
[प्रस्तुत लेख श्री जयपालसिंह गिरासे की संशोधित बौद्धिक सम्पदा है और उनकी पूर्व अनुमति के बिना प्रकाशन तथा विनियोग कानूनन जुर्म है]


https://jaypalg.blogspot.com/2014/10/blog-post.html




धुळे डायरी

...१)..अनेक हायवे क्रॉस होणार्या धुळ्यात तशी गुन्हेगारी नवीन नव्हतीच .. विविध हायवे त्यातून गुजरात +एम पी +नंदूरबार आदिवासी भाग टच बोर्डर..प्रचंड प्रमाणात २ नम्बर चे धंदे .( महारास्त्रात -भांग+गांजा+अफू +काळा माल +नकली दारू रॉकेल +डीझेल +पेट्रोलियमभेसळ + सुपारी देवून खून घडविणे वैगरे+ बद्दल भाड्याचे खुनी पुरविणे हा अनेकांचा धंदा आहे ).आणि त्यातून धुळ्यात आरटीओ आणि आयपीएस क्रीम पोस्टिंग समजतात ( प्रशासकीय आय ए एस मात्र धुल्यातून पळ काढायला बघतो ..प्रशासकीय फिल्ड मध्ये धुळ्याला बदली म्हणजे शिक्षा समजली जाते )..मागे अक्षय कुमार च्या एक चित्रपटात हि धुळ्यात बदली होणे म्हणजे संकट असा संदर्भ येवून जातो ..तसा चित्रपट श्रुष्टी ला धुळ्या बद्दल काय आवड आहे कुणास ठावूक ?? --शोला ओउर शबनम चित्रपटात -गोविंदा आणि त्याचे साथीदार पोरींशी कबड्डी खेळण्या साठी धुलिया कि टीम बनून जातात -- तर अक्षय कुमार चा एक भिकार चित्रपट तीस्मार खान मध्ये त्या मूर्ख लोकांचे गाव धुलिया दावलेले असते ..तर अक्षय कुमार चा एक पोलीस अधिकारी चित्रपट ज्यात शत्रुघ्न सिन्हा +परेश रावल त्यात अधिकारी ला धुलींया ला पाठवायची धमकी देतो ..तर त्यात तो पोलीस अधिकारी त्या नेत्याला आधी तू चित्रपट तिकिटे ब्लाक करीत हिंडायचा असे बोलतो (हे वर्णन धुळ्यातील काही राजकारण्याना लागू होते ..+त्यात त्या राजकारणी मनुष्याचे नाव सुद्धा एका रियल लायीफ राजकारण्या चे घेतले आहे ..!.. कम्प्लीट माफिया राज म्हणजे काय ते ह्या शहरात समजते ...राजकीयदृष्ट्या कॉंग्रेस च्या विविध गटात वाटला गेलेला हा जिल्हा आहे -नुकतीच भाजपा ने बर्या पैकी सेन्ध्मारी केलीय -नाहीतर आमच्या मोहाडी गाव चे रोहिदास पाटील ह्यांचा जवाहर सूतगिरणी चा जवाहर ग्रुप विरोधात अमरीश भाई पटेल ह्यांचा एनकर ग्रुप अशी रोमहर्षक लढत होत असे ..!! द वा पाटील +रामराव दादा पाटील -गुजरताइ भामरे --शालिनीताई पाटील --किशोर आप्पा पाटील - हल्ली अनिल अन्ना गोटे जोरात आहेत धुळ्यात - दादासाहेब रावल- शरदचंद्र पवार ह्यांचे खास --राजवर्धन कदमबांडे ..( कदमबांडे ह्यांची सुद्धा धुळ्या जवळ पास इनामी वतन होते --थोडक्यात संस्थानिक --तसेच धुळ्यातील १८४५ साल ची धोंडो शामराव गरूड ह्यांची सुद्धा धुळे शहरात जहागिरी होती -- तोच भाग रावल फ्यामिली चा -हे पण ग्रामीण धुळ्यात संस्थानिक होते (संशोधक रावळ हे राज्पुताण्यातून ख्नादेश्यात आले असे सांगतात )तरी बागुल नावाचे शासक जे धुळ्याच्या जवळपासच्या प्रत्येक जातीत आडनाव सापडते --ते कोणी मोठे लढवैय्ये असावेत ---भीतीने बागुलबुवा दाखवला --हा मराठीत वाक्य प्रचार खानदेशी बागुल लोकांनीच दिला आहे --खान्देश्यात एक आडनावाची एक वेगळीच एकी आढळते -- आमच्या मोहाडी जवळील अवधान गावात गावातील सर्व जातीचे नाव (वाघ आढळते )तर म्हसदी गावी सर्व जातीत सर्व जन देवरे आहेत--विशेषता : साक्री च्या आजूबाजूच्या गावात --रांडन !! हा शब्द /भाषिक फ्रेज सारखीच आढळते -कोल्हापूरच्या रांडेच्या ह्या शब्दा प्रमाणे ... .!!-खानदेश भाग जरी गुजरात च्या सुलतान कडे होता तरी नंतर सतराव्या शतकात हा भाग निजामशाही चा भाग होता --धुळ्यातील एक प्राचीन वसाहत मोगलाई म्हणून गणली जाते --प्राचीन धुळ्याचे जुने धुळे +मोगलाई +देवपूर असे ३ भाग होत असत .!--नंतर निजामशाही कडून १७५२ च्या दरम्यान सरदार विंचूरकर ह्यांच्या कडे हा भाग ताब्यात आला --तर त्यांनी त्याची अनेक इनाम -- अनेक सरंजामदार कडे दिला - बालाजी बळवंत (सोनार ???) असे जुने जाणकार सांगतात ..ह्याच विंचूरकर सरदारांनी त्रंबकेश्वर मंदिरा चे जीर्णोद्धार केला आणि त्याच्या कळसाला सोन्या चे बनविले --तो झ्हेंडा आज पण सोन्याचा आहे -- मालेगाव च्या भुईकोट किल्ल्याच्या संरक्षण साठी त्यांनी अरब तैनाती फौज स्वीकारली -तिचा तळ-त्यामुळे मालेगाव मधील मुस्लीम् पोप्युलेष्ण चा भाग हा अरब वंशी आहे .!!(मालेगाव बद्दल कधी स्वतंत्र लिहील )...तर हे धुळे पेशवाई कडे १७९५ ते १८१८ कडे सरदार विंचूरकर ह्यांच्या सरदार मंडळी कडे होते -लालिंग -परगणा होता -सोनगीर चा किल्ला -थाळनेर भामनेर साल्हेर -मुल्हेर कडे सत्तेची केंद्रे होती (इतकेच काय शिरूड गाव चे काली मंदिर शाक्त लोकात प्रसिद्ध होते --त्याचीही एक दंत कथा आहे -हेमाडपंथी शैलीत बांधलेले मंदिर ..!!आणि त्यातील भांडी..ह्यांचा किस्सा कधीतरी नन्तर लिहील ..मित्रा च्या पाटीलकी चे हे गाव तिथल्या चुरड /हडळ च्या बद्दल पण एक किस्सा आहे जो नन्तर लिहील;..)-- तर ह्या संस्थानिक लोक कडून १८१८ ला इंग्रजांनी धुळे जिंकले त्या काळी क्य्पाटन ब्रिग्स नावाचा इंग्रज अधिकारी होता ..त्यांची कबर पण धुल्यातच जिजामाता हायस्कूल च्या जवळ जी ख्रिश्ती स्मश्यान भूमी आहे -- जिल्हा ब्यांक समोर तिथे आहे असे सांगत ..त्याच्या नावाने आग्रारोड ला ब्रिग्स पेठ असे सुद्धा म्हणत असे जुने जाणकार सांगत ..

.............................. हे असे हे धुळे मध्ये गेल्या १३५ वर्ष्या पासून जास्त माफिया अक्षरश : वाटून घेतेले आहे कारण आग्रारोड आणि बाकीच्या वस्त्य कृत्रिम रीत्या निर्माण करून घेतलेले आहे ..भारत रत्न सर मोक्षगन्डम विश्वेश्वरया ह्या अचाट बुद्धीमत्ते च्या इंजिनियर ने धुळ्याची पाणी पुरवठा वेवस्था केली तर धुळ्याची रचना ब्रिग्स ने केली .. जयपूर सिटीच्या धर्तीवर प्री-प्लान पद्धतीने केली...काटकोनात भेटनार्या गल्ल्या पहिली गल्लीते चौदावि गल्ली ..प्रतेय्क गल्लीचा एक खुंट ठिथ पाण्याची गोल टाकी आणि तालीम ..गल्लीच्या दोन्ही बाजूस ...आणि त्यांच्यात स्पर्धा आमच्या मोहाडी गावाची भूमिगत पाणी टाकी तिखि पाणी प्रकल्प जिथे गुरुत्वाकर्षण नियम वापरला आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक प्रवाह नाही होळकरांच्या इंदोर संस्थानिकांचे अनेक मारवाडी व्यापारी _इंग्लिश मुंबई मधील अनेक पारशी +मुस्लीम+बोहरा व्यापारी इथे वसविले गेले असे सांगात.... ..!!

काही_आठवणी_अंतिम_भाग --खानदेश..१३७० साली सुलतान मोहम्मद शाह तुघलख चा पुतण्या फिरोजशाह तुघलख ने आपल्या विश्वासू कुरेशी साथीदार मलिक फारुखी याला थाळनेर आणि करवंद ची जहागिरी दिल्याचे फर्मान आढळते.ज्यात खानदेश चा उल्लेख आहे -त्या नन्तर फारुखी राजघराण्याने एकूण ३०० वर्षे ह्या ठिकाण चे राज्य सांभाळले..गुजरात च्या सुलताना ने आपल्या फर्मानात यांना" #सिपह_सालार_ए_खानदेशहि पदवी दिली."..खानदेश नावाचा मुगल इतिहास इथे सुरु होतो ..!! खानदेश च्या प्राचीन इतिहासावर मी येणारच आहे ,..!

१ )कान्हदेश -- हा भाग खांडववन समजला जातो --इथले रहिवासी हे स्वतःला कृष्णाचे वंशज म्हणजे -यादव असे समजतात --यादव लोकांनाच अहिर हे सुद्धा संबोधन आहे -- म्हणून इथल्या भाषेला अहिराणी असे हि संबोधतात-अहिरांची राणी ती अहिराणी -- त्यामुळे कान्हाचा देश तो कान्हदेश --ते खानदेश असा प्रवास ..आज हि इथले दुध दुभते अप्रतिम ..

२) कान नदीच्या खोर्या तील प्रदेश -- पान्झरा नदीच्या खोर्यात कान हि नदी सुद्धा आहे तिच्या खोर्यातील प्रदेश ..

३) .१५९९ सालीं अकबरानें जातीनें खानदेशवर स्वारी केली व अशीरगड जिंकून घेऊन तेथील शहा बहादूरखान यास कैद करून किल्ल्यांत पाठविलें. खानदेश हा या वेळेपासून अकबराच्या राज्यांत मोडूं लागला. अकबरानें या प्रदेशाचा कारभार पाहण्याकरितां आपला मुलगा दानियाल यास सुभेदार नेमलें. याच्या नावांवरून कांही काळपर्यंत खानदेशला दानदेश हें नांव पडलें. १७ व्या शतकाच्या मध्यकालांत खानदेशची भरभराट झाली होती. दख्तनमधून वर हिंदुस्थानांत जाण्याचा व्यापारी मार्ग खानदेशमधून जात असल्यानें खानदेश सधन बनला होता

४)खान देश --खाना ची राजवट असलेला प्रदेश ? फारुकी राजे स्वतः ला खान हि पदवी लावून घेत ..

५)-कानन -अथवा फड असलेला प्रदेश-- मुख्यता ह्या प्रदेश्यातील नद्या ह्या अनेक सखल भागात वाहत असत -त्यात तीन फुटा ची उभी भिंत असे जी जोरात आलेल्या पाण्याच्या प्रवाहाला आपोआप ..कालव्या च्या दिशेने ढकलत असे ..जी जगातील प्राचीन +अतिशय अभिनव +अतिशय उपयुक्त जल व्यवस्थापन पद्धत असे -जी नष्ट झ्हाली आणि धुळे शहराची पाण्याच्या बाबतीत वाट लागली ..मी स्वतः हनुमान टेकडी कडून मोगलाई मोती नाला ते कलेक्टर बंगला पासून ते आपला महारास्त्र त्या खालून ज्योती सिनेमा शेजारून जुन्या धुळ्या शेजारून जाणारा पाट पाहिलाय -जो निव्व्व्ल गुरुत्वाकर्षण सिद्धांत वर काम करीत असे ( ह्यात माजी आमदार रा भ चौधरी साहेबांचा हात समजतात )--तर खांदेश्यात हि अप्रतिम फड सिस्टीम देवगिरी च्या यादव काळात अस्तित्वात आली ( सुलतान शाही पूर्व हा भाग देवगिरी रामदेवराय यांच्या अधिपत्याखाली येई ) मुगल काळात अबुल फजल तसेच परदेशी प्रवासी तर्नेयर ने हि ह्या फड सिस्टीम चा उल्लेख आपल्या लिखाणात केलेला आढळतो ..!!)

६ )कानबाई चा प्रदेश -- कानबाई चे पूजन +पालखी निव्वळ खान्देश्यात साजरी केली जाते ..तिला खानदेश ची माहेरवाशीण समजले जाते -त्या कानबाई चा प्रदेश ...त्या संदर्भात पण असे सांगितले जाते कि ...देवगिरी च्या साम्राज्याचा महासुंमंत कान्हेर देव राजा होता ..जेव्हा अल्ला उद्दीन खिलजी ने आपल्या अफाट सैन्या सह देवगिरी वर हल्ला केला तेव्हा रस्त्यात त्यांना कान्हेर देव ने अडविले तेव्हा त्यच्या दोन्ही भार्या वाघिणी सारख्या लढल्या ..त्यांनी अल्ला उद्दीन खिलजी ला परत पाठवले ..तेव्हा पासून त्यंच्या बद्दल गीत पराक्रमाच्या गाथा निर्माण झाल्या ..तेव्हा पासून कानुबाई राणू बाईची पूजा सुरु झाली आणि त्यंचे कान्हेर देवाशी लगीन लावायची पार्थ निर्माण झाली ..!! कान बाई ची अनेक गाणे सीडी मध्ये अजूनही मिळतात

७ )कानिफनाथांचा प्रदेश ?-नासिक व त्रंबक ला जाताना बेळगाव ढग्या शेजारी रस्त्यावर गहिनीनाथ कबर आहे मुस्लीम लोक तिला गैबी पीर म्हणून पूजतात -तसे जालिंदर नाथास जन पीर -तर कानिफनाथांचा उल्लेख कान पीर असा करतात -- ह्यांच्या जीवन काळात जे मजला दर मजल -उपदेश +सत्कार्य करीत फिरत --त्यांच्या भ्रमण फेरीचा प्रदेश ?? (तसे पाहिले तर वाणीची सप्तशृंगी देवी हे नाथ पंथीयां ची पंढरी --खान्देश्यात वणी च्या देवी ला पायी जाण्याच्या प्रचंड जुनी परंपरा आहे -लग्न झलेली नवीन जोडपी सुद्धा इथे जात असत .!-मास्तेंद्र नाथाने इथेच सर्व देवत सिद्ध केल्या त्यावरून -इथे नाथ संप्रदाय प्रभाव पण नाकारता येत नाही .८)indian history congress 1951 च्या नुसार --१२४० च्या नंदा शिलालेख नुसार -राजा कान्ह देव चे वर्णन आहे --त्याची कीर्ती -ताकद जंगलातील आगी प्रमाणे वाढत जाते * हा राजा अहिर वंशीय होता --त्यावरून ह्या प्रदेष्याचे नाव कान्ह देश पडले असावे ..!!

#अहिरवंश : -- प्राकृत डिक्शनरी नुसार अहिर -अभिर आणि गवळी (ग्वाला ) हे समान अर्थी शब्द आहेत -- ज्याचे समानार्थी शब्द यादव सुद्धा आहेत ( अहिर -आभीर -गवळी -यादव हे एकाच वंशाचे असावे असा तर्क ह्यातून निघतो ..!! ओरीयेन्तल इंस्तीत्युट च्या १९८५ च्या जर्नाल नुसार --खानदेश को "मार्कन्डेय पुराण" व जैन साहित्य में अहीरदेश या अभीरदेश भी कहा गया है। इस क्षेत्र पर अहीरों के राज्य के साक्ष्य न सिर्फ पुरालेखों व शिलालेखों में, अपितु स्थानीय मौखिक परम्पराओं में भी विद्यमान हैं असा संदर्भ येतो --

#अहिराणी- अभिराणीचा अपभ्रंश ‘अहिराणी.’ अभीर नावाचे लोक प्राचीन काळापासून खानदेशात राहत होते असे उल्लेख अनेक ग्रंथांतून व शिलालेखांतून मिळतात. रामायण-महाभारतातही अभिरांचे उल्लेख येतात. इ. स. चौदाव्या शतकात अभीर लोकांची एक वसाहत खानदेशात असल्याचे शिलालेखांवरून दिसते. आजही खानदेशात अहिर िशपी, अहिर ब्राह्मण, अहिर सोनार, अहिर कुणबी अशा जाती आढळतात. अहिरराव, अहिरे ही आडनावे आजही विपुल प्रमाणात दिसतात. प्राचीन काळी हे सगळे अभीर होते. खानदेश हा मूळचा अभीर किंवा अहिर यांचा प्रदेश.

अहिराणी धुळे, जळगाव, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांत बोलली जात असली तरी तिचे बोलले जाणारे स्वरूप सर्वत्र सारखे नाही. धुळे हा अहिराणीचा केंद्रप्रदेश मानला जातो. नाशिक जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर मराठीचा जास्त पगडा असून, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अहिराणी भाषेवर गुजरातीचा प्रभाव आहे. गुजरात सीमेला लागून असल्यामुळे हा प्रभाव नवापूर, नंदुरबार भागांत जास्त आढळतो. जळगाव जिल्ह्यातील अहिराणी भाषा वऱ्हाडी-वैदर्भी भाषेला जवळची वाटते - मराठी भाषेतील आद्य ग्रंथ -लीळा चरित्रात काही अहिराणी शब्द आढळले आहेत -तर काही अहिराणी भाषेचे अभ्यासक हि भाषा ज्ञानेश्वर महाराज यांना माहिती होती असे सांगतात ..

#फारुखी वंश - इस्लाम चे दुसरे खलिफा उमर बिन खित्तब कुरेशी हे मोहम्मद पैगंबर यांचे अत्यंत विश्वासू साथीदार समजले जात ..त्यांची आदर्श न्यायदान कौशल्य +सत्य आणि असत्य ह्यातील फरक करू शकण्याची वृत्ती पाहून स्वतः पैगंबर साहेबांनी त्यांना पदवी दिली -फारुख -- म्हणजे सत्य /असत्यात फरक करू शकणाराअसा जो तो .(मराठी त आलेले अनेक शब्द अराबिक +फारसीतून आलेले आहेत ह्याचे श्रेय सुद्धा मोहम्मद तुघलख यांना जाते ..देवगिरी आर्थात औरंगाबाद ला राजधानी आणताना त्यांनी पर्शियन हि राज्य व्यवहार भाषा व वैयक्तिक जीवनातील अराबेक चा प्रचार केला त्यामुळेच दुनिया +तुफान +किल्ला +जहाज +कमीज +बुरुज +कंदील +मंदिल+वकील हे सर्व मुळ अरेबिक शब्द मराठीत आले ..असे अनेक शब्द आहे पण माझा जास्त अभ्यास नाही ..तसेच पर्शियान म्हणाल तर भारताची अनेक वर्षे हि राज्य व्यवहाराची भाषा होती -संत एकनाथ हे सुद्धा पर्शियन जाणीत..कारकून +स्वार +कागज +कलम +स्वार +जमीन दार +जबरदस्त+ परवानगी +गुन्हेगार +जबानी इत्यादी शब्द हे पर्शियन आलेत ..)

१६ व्या शतकात सम्राट अकबराने फारुखी शासन आपल्या अखत्यारीत आणले

त्या नंतर दाख्हन चा गव्हर्नर असताना शाहजहान ने बुर्हाणपुरात वास्तव्य केले होते .-त्यांची लाडकी बायको मुमताज इथेच मरण पावली ताजमहाल निर्माण होई परेंत .तापी किनारी एक स्मारक बनविले होते ..काही वर्षे तापी च्या किनारी मुमताज चे शव तिथल्या बुर्हाण पूर जागी होते - ताज महाल च्या इथे मग तीचे शव नेण्यात आले

१६२९ साली शाहजहान ने आपला सिपाःह सालार ला लळिंग ह्या किल्ल्या कडे पाठविले असता..प्रचंड पावूस पडला --ख्वाजा अबुल हसन ने आपल्या कडून संदेश पाठीविला--धोलीया--त्याचा अपभ्रंश होत आज च्या शहराचे नाव बनले धुलिया-( धुळे शहरात अर्बन ब्यांक कडे अठराव्या शतकातील इंग्रज सैनिकाच्या समाधीवर धोलीया चेच नाव कोरलेले आढळते ..त्या ठिकाणीच धुळे शहर विट्ठल सुंदर सोनार कडून जिंकणार्या क्य्पाटन ब्रिग्स ची समाधी आहे -हा तब्बल १०० वर्षे जिंकला -हा पर्शियन चा जाणकार होता ह्याच ब्रिग्स ने खानदेश होळकर कडून जिंकला ह्यानेच लळिंग घात बांधला आणि भिल्ल लोकांचे प्रस्थ कमी करणे साठी धुळ्यात इतर वसाहती उभारल्या -ह्याने इंदोर आणि मुंबई वरून खास मारवाडी +बोर्ह्री मुस्लीम वसविले ---आज च्या ब्रिग्स च्या नावावर धुळ्यात एक पेठ म्हणजे गल्ली सुद्धा आहे कदाचित आग्रारोड ला ब्रिग्स पेठ म्हणतात !-(धुलिया पुढे जुल्वानिया एम पी मधील त्याच्या नावाची पण अशीच दास्तान असावी -- धुळ्य शहरातील प्रसिद्ध खुनी मस्जिद पण शाहाजहान नेच बनविली .पुढे इंग्रज काळात गणपती च्या मिरवणुकीत तिथे दंगल उसळली त्यातून काही खून पडले -त्याचे नाव खुनी मस्जिद पडले असे जुने जाणकार सांगतात (तसाच धुळ्यात एक खुनी गणपती सुद्धा आहे )

नावा वरून आठवले जसे पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणचे गणपती प्रसिद्ध आहेत तसेच इथे विविध गल्लीत मारोती प्रसिद्ध आहेत - लालबाग चा मारोती - सोन्या मारोती -चीम्प्या मारोती -भांग्या मारोती -मिरच्या मारोती -पंचमुखी दक्षिण मुखी पूर्व मुखी असे विविध प्रकार आढळतात .! .( असे सांगतात १८ व्या शतकाच्या उत्तरार्ध मध्ये टिळकांनी नदी किनारी भाषण दिले होते +राष्ट्रवादी तरुण तयार होण्या साठी .आद्य तालीम बनवली ..(टिळक स्वतः तालीम बाज होते --२ वर्षे शिक्षण सोडून शरीर कमविले होते असे सांगत -- त्यांचे आद्य शस्त्र गुरु लहूजी राघोजी साळवे हे इंग्रज विरोधी बंडखोर होत ...इंग्रजी सत्ते विरुद्ध लढताना .त्यांचे वडील . धारातीर्थी पडले -.(पुढे त्याचाच -नवसाला पावणारा मंगीर बाबा बनवून टाकला लोकांनी ..असो विषयांतर होतेय ..=तर टिळक आणि वासुदेव बळवंत फडके त्यांचे तालमीतील शिष्य होते ..)... अश्या टिळकांनी ज्या मैदानात भाषण दिले तिथे विजय व्यायाम शाळा उभी राहिली ..पुढे धुळे करांचे कौतुक असे कि ..नंतर च्या प्रत्येक तालमीने विजय व्यायाम शाळा हे नाव स्वीकारले ..नव जीवन विजय व्यायाम शाळा/ नवजीवन रामदास विजय व्यायाम शाळा /आद्रष्य विजय व्यायाम शाळा /नवभारत विजय व्यायाम शाळा /स्वतंत्र भांग्या मारोती विजय व्यायाम शाळा -भैय्या पहिलवान करनकाळ यांची/पवनपुत्र विजय व्यायाम शाळा --बाजीराव नाना पवार /कोंडाजीमामा वस्ताद -विजय व्यायम शाळा (गोपनीय रुपात तात्या टोपे ह्या कोंडाजी वस्ताद सोबत तालीम करी असे जुने जाणकार सांगत .) राजश्री शाहूमहाराज विजय व्यायाम शाळा /.महाकाली विजय व्यायाम शाळा /साई बाबा विजय व्यायाम शाळा ..बालगोपाल विजय व्यायाम शाळा -- इतकेच काय मुस्लीम लोकांची --बिस्मिलाः विजय व्यायाम शाळा ..!! .. अश्या बोटावर मोजता न येणाऱ्या तालमी -- सरळ गल्ल्या - ४ खुंट प्रत्येक खुंटावर एक तालीम --जिचे बाकीच्या ताल्मिंशी वैर ..धुळ्यातील लाल्बाग चा गणपती सुद्धा लाल आहे - तसे पाहिलेतर नदीकिनारी जशी नाशिक पंचवटी म्हणजे पाच वडाचा समूह आहे तशीच मंदिरे धुळ्याच्या नदी किनारी असल्या कारणाने त्याला सुद्धा -धुळे पंचवटी म्हणतात ..नाशिकच्या रामवाडी प्रमाणे धुळ्यात सुद्ध रामवाडी आहे -तसेच मालेगाव च्या प्रमाणे धुळ्यात सुद्धा पाचकंदील मार्केट आहे ज्याला नुकतेच १६० वर्षे झ्हालेत मालेगावात सुद्धा हजारखोलीभाग आहे .(मालेगाव हे सरदार राजेबाह्द्दूर यांचे वतनाचे गाव होते उत्तरे कडे जाताना मध्ये रेस्ट घेण्य साठी मालेगाव चा प्रसिद्ध भुईकोट किल्ला बनवला होता ..त्या तील तैनाती फौज अरब स्तान मधील असल्याने अनेकांचे वंश अरबी लोकांशी जुळतात.तर इंग्रज सरकार ने इथे जाणीवपूर्वक विणकर बसविले ते मुख्यत: मुल्सिम वंश चे असल्याने ह्या शहरात मुल्सिम लोक संख्या लक्षणीय आहे ) मा अनिल गोटे त्या ठिकाणी नवीन कॉम्प्लेक्स चा प्लान करीत आहेत ..@८० च्या दशकात मित्राच्या टाटा-मार्साडीज चे स्पेअर पार्ट कुठेच मिळत नव्हते -जर्मनी तून मागविणे आवाका बाहेर चे काम होते-इथल्या भंगार बाजारात ते पार्ट मिळाले ..असे आहे मालेगाव चे पाचकंदील..(कधी मालेगाव ला बिरयानी +शिवायला शेरवानी करून बघा ..मज्जा येवून जाते )

#इव्हान न्यायमूर्ती रानडे ह्यांच्या पत्नी रमाबाई रानडे ह्यांनी १८ व्या शतकातील आठवणी -स्वतः संधर्भ आठवणी/आमच्या आयुष्यातील आठवणी -- ह्या पुस्तकात लिहिल्या आहेत (न्या .रांनडे त्या काळात धुळ्याचे न्यायधीश होते -तत्कालीन पुस्तकात -एक गूढ अनुभव -त्यांना सोल गल्लीत आल्याचा उल्लेख आहे .१८८९ -साल ..हल्लीची खोल गल्ली असावी तर ज्या घरात न्यायमूर्ती राहायला होते त्या घरावर च्या बंगल्याला धुळे शहराचे आमदार चौधरी साहेब यांनी रानदे स्मृती हे नाव दिले होते -तसेच साक्री रोड ला जमनागिरी नावाच्या साधूचे ठिकाण सुद्धा त्याचा पण पुस्तकात उल्लेख आहे (आमच्या आयुष्यातील काही आठवणी -रमाबाई रानडे ह्या नावाने -- त्यांनी १८९० साल च्या धुलायचे जहागीरदार धोंडे शामराव गरूड ह्यांच्या भांडूप मधील बंगल्याचे पण उल्लेख केले आहे -बाग आणि वाडा भांडूप ला होता +त्या काळातील जमानागिरी चा संदर्भ आला आहे (--ह्या जमानागिरी ठिकाणी अनेक शिव पिंड आहेत -तिथल्या एका साधू कडे नागमणी असल्याची चर्चा ८० च्या दशकात अफवा चाले लहानपणी--एका माणसाला कसा साप चावला आणी त्याने तो कसा साप चालवलेल्या ठिकाणी ओला करून घासला आणी कसा त्या खड्याचा आकार +रंग बदलला वैगरे लोककथा संगीत -तिकडेच एका मूर्तीतून एका डोळ्यातून पाणी ठीपाकायचे -पाहिले आहे .हा जमनागिरी महंत आणि...९० च्या दशकात एका पिस्तोलगिरी महंत चा लई बोलबाला झाला होता - जो एटलास सायकल ला विविध चिंधी बांधून फिरे -हल्लीच्या महाकाली मंदिरा च्या इथे त्यांची धुनी असायची -गांजा प्यायला आणि सटटा वाले खूप बसत +आकडे वाले लोक पण खूपच येत तिकडे +तिकडे तालीम पण असायची -तिथे पायर्या मारायला+जोर काढायला मी जायचो.!त्या मंदिराच्या पाठीला पाठ असलेल्या प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरा च्या आरतीला सुरुवात होताच सर्व कुत्रे एकात सुरात विव्हळत असत हि आठवण मोहिनी विद्या साधना व सिद्धी ह्या पुस्तकाचे लेखक श्रीयुत .अ ल भागवत ह्यांनी लिहिली आहे (हे धुळे शहराच्या ६ व्या गल्लीत राहत -माझि यांच्या शी कधीही भेट झाली नाही त्यांचे शिष्य प्री.राम म्हात्रे ह्यांना मात्र फोन वर बोलालोय..) हीच घटना मात्र मी देवपूर चर्च जे जयहिंद शेजारी आहे तिथे संध्याकाळ च्या प्रेयर ची घंटानाद झाल्यावर सर्व कुत्रे सुरात सूर मिसळत ..!!हे स्वतः डोळ्याने पाहिलेय ..पुढे वाघ बापूच्या एका स्वामी मुले सर्व बाकीचे बाबा गप्प गार झाले ..बोले तो मार्केट ढिला ..

#शिरूड: माझ्या लिखाणात शिरूड च्या बद्दल एक दोन उल्लेख आणी नंतर सागेन असे वाक्य येवून गेले -त्या शिरूड बद्दल -इंग्रजांनी जसा ठरवून कापड उद्योग धुळ्यात वसविला ..जशी धुळ्यात मनमाड जीन होती -तशी शिरूड ला जाताना सुद्धा एक उद्वस्त जुन्या काळातील जीन मिल लागत असे ०जि पूर्ण उद्ध्वस्त झलेली होती ..(गावकरी त्याबद्दल भूत -प्रेत उपद्रव वैगरे म्हणत -- लिहिताना मी स्वतः ला सुद्धा फाट्यावर मारून सत्य ते लिहित असतो -त्यामुळे जे एकले +पाहिलेय त्या बद्दल लिहित आहे -तुझा विश्वास आहे काय ? हे असे नसतेच वैगरे फाटे फोडू नयेत ..!)!

ह्याच धुळे ते चाळीसगाव परेंत एक ट्रेन होती धुळे चाळीसगाव प्यासिंजर जिला नुकताच ११८ वर्षे पूर्ण झालेत -आज पण तशीच जुनी सिग्नल सिस्टीम आहे -आज पण त्या स्टेशन वरच्या मशीन मध्ये ट्रेन ड्रायव्हर एक लोखंडी गोळा टाकतो --आणी दुसरा गोळा त्यातून निघतो -तो घेवून जातो (हे दुर्मिळ दृश्य बघणे सारखे असते ) -तिला एक डबा फक्त मुबई ला दुध संकलन करून पाठवण्या साठी होत असे -पण विना सहकार नाही भ्रस्टाचार वैगरे वैगरे होवून त्या संकलनाची पण वाट लागली ..त्यात शिरूड वरून एकेकाळी भरपूर दुध जात असे ..शिरूड मोर्ताड तांडा वैगरे दुध संकलन केंद्रे असत ..

#शिरूडचा_पंडित_काका -- लहानपणापासून मी एक वाया गेलेला विद्यार्थी असल्या कारणाने मला त्या काळातही -खजिना |+पैश्याचा पावूस +इंदिरागंधी चा कॉयीन +डबल इंजिन -दुतोंड्या साप +ज्योतिषी +रत्न वैगरे मध्ये जाम इंटरेस असे ... धुळे जिल्ह्यातील नामवंत ज्योतिषी म्हणजे शिरूड चा पंडित काका असे - ९३-९४ साली मी स्वतः पंडित काका ला बेड रीडन बघितला आहे - संडास +बाथरूम बेड वर होत असताना -पंडित काका च्या समोर एक मोठे घद्याळ टांगलेले असे -त्यात प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या प्रश्न्चे टायमिंग बघून + कृष्णमुर्ती पद्धत वापरून तोंडी गणित घालून पंडित काका अचूक उत्तर देत असे - मी डोळ्यांनी पाहिलेय ..!पण्डितं काकाचा मुलगा आता ते बघतो असे सांगतात पण जयनी असली पाहिलेय -त्याला ..असो

#पटेल_पाटील_भावकी - खांदेश्यात अनेक शतके खान लोकांचे राज्य असल्याने मुस्लीम धर्मांतर पण पाहिलेय ( भालचंद्र नेमाडे ह्यांच्या मतानुसार इंगाराजनी केलेल्या पाहील्या खाणेसुमारीत - लोकांनी -स्वतः चा धर्म, -हिंदू -मुसलमान /मुस्लिम हिंदू असे लिहिल्याचे सांगितले होते )

पहिला मुलगा झाला तर त्याला मुस्लीम करीन वैगरे पिराला नवस असायचा आणी पिराला पहिली चादर द्यायचा मान - गावाच्या पतील देशमुख अथवा प्रभावुई घराण्यास असायचा .!!

तर तसे पाहिले तर पाटील खानदान मध्ये कोणाची मौत झाली तर - पटेल मंडळी सुतक धरतात ,आणी आमचीच भावकी असून धर्मांतर करून पाटील चे पटेल झालोत असे सांगीत..!!

#काकुनी सांगितलेली 19 व्या शतकातील सुरुवात कालीन दंत कथा---- माझा मित्र शिरूडचा गजानन गुलाबराव पाटील ह्याचे घराणे शिरूड गावात तालेवार आणी राजकीय दृष्ट्या बाहूबली होते..त्यच्या मातोश्री ने त्यांच्या सासरे बुवा जे स्वतंत्र सैनिक होते त्यंच्या बद्दल सांगितलेली दास्तान stori cऐकली-मीच त्या काळी ८ वीत होतो -[ खान्देश्यात उन्हाळा भयंकर असे त्या काळी सर्व जन रात्री बाहेर खाटा टाकून झोपत ..अश्या वेळी गावच पाटील म्हणजे मोठे प्रस्थ ..आमचे सासरे बुवा ओरीजनल दुध तूप आणी नावाजलेले पहिलवान असे काकू संगीत - दारू प्यायला बसले कि कळशीभर दारू लागीत असे वैगरे स्टोरीज काकू संगीत(मी स्वतः त्यांच्या काठीतील पोलादी गुप्ती पाहिलीय ) अश्या ह्या पाटील बुवा गावात रात्री ३ डाकिनी दिसल्या ..(स्वातनत्र्यपूर्व काळ आणी गावातील अंधार वैग्गरे तर ..आधीच लोड झालेल्या पाटील बुवाला राग आला -कि माझ्या समोर माझ्या गावात डाकिन येतेच कशी ?? तेव्हा नशेत पतील्बुवानी जाम शिवीगाळ डाकिनी न केली --

#डाकिनी- खान्देश्य हा -डांग आदिवासी एरिया लागून असल्याने प्रचंड तंत्र मंद्त्र -मांत्रिक -भगत वैगरे प्रकार मानीत असत -- डाकीण म्हणजे नाशिक च्या भाषेत भुताळी स्त्री ( तंत्र विद्या शिकलेली - प्राक्तीस करणारी -- डाकीण माणसाचे काळीज खाते - नजर लावून दुध दुभते मारते -लहान मुलांना पळवून नेते-घरादारावर करणी करून होत्यचे नव्हते करते ..माणूस नादाला लावून त्याचे रक्त शोषण करते -तिच्या जवळ काही अमानवी शक्ती असतात -सात स्म्श्यानात खेट मारते अश्या अनेक अंध श्रद्धा खान्देश्यात त्या काळात प्रचलित होत्या )- खेट म्हणजे अमवस्या पौर्णिमा चा दिवस त्या दिवशी स्मश्यानात विविस्त्र जावून विविध विधी उरकून एक एक दैवत सिद्ध करणे वैगरे -डीप विषय आहे .,.!!! डाकिनी चा पण दिवसा असतो खास अमावास्या -पोर्णिमा असतात ज्या दिवशी त्या विशेष प्रभावी +ताकद वान असतात ..! त्यांनी त्या दिवशी गुप्चूप शिव्याशाप एकले आणी आमचा दिवस येवू दे तुला बघतो असे म्हणत तिथून साधने करीता स्म्श्यानात निघून गेल्या ) (हा त्या कालचाबंडखोर स्त्री वाद असे माला वाटते - समाजातून नाकारलेल्या स्तीर्या त्याबंचे सहज शोषण व्हायचे -टाकलेल्या -मुल न होणार्या वांझ -हि बायको लाभात नाही - चारित्र्याचा संशय ह्या विविध मुद्द्यावर स्त्री समाज बहिष्कार करी त्यातून अश्या काही बायका हा मार्ग निवडीत -)- नंतर जेव्ह अमवस्या आली आणी पाटील बुवा नील मध्ये होते तेव्हा ह्याच डाकिनी नी त्याची खाट जमिनी पासून २ फुट उचलत गोल गोल फिरवत -आम्ले गाया देस का?### वैगरे म्हणत ..माफी मागे परेंत गोल गोल उचलून फिरवले होते...!! अशी स्टोरी एकून आहे ..!

#शिरूड_चे_काली_मंदिर - हे एक बाराव्या शतकातील हेमाडपंती काली मंदिर असल्याचा उल्लेख जिल्हा ग्यझेट मध्ये आढळतो - संत ज्ञानेश्वर ह्यांच्या समकालीन खुणा आढळतात असे ओर्कीयोलीजीकल सर्वे ऑफ इंडिया वाले म्हणतात .सध्या हे मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत गेलेले आहे ..तर ह्या गावाच्या शेजारील मार्गावरून वाघळी ला लीळाचरित्र काल सर्वज्ञ चक्रधर स्वामी गेले होते असे सांगतात.विविध महानुभावी मंदिरे खान्देश्यातील चक्रधर भ्रमण दर्शवत..मंदिराचा पुरातन गाभारा, विहीर, सभामंडप आदी पाहण्यासाठी पर्यटक आणी itihas प्रेमीची वर्दळ असते. मात्र मंदिरातील कलाकुसरने नटलेल्या स्तंभांची पडझड झाली आहे. पुरातत्त्व विभाग देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात."हल्ली तो भाग पुरातत्व खात्याच्या पझेशन मध्ये आहे असे सांगत..अखंड दगड घेवून त्यात केलेली कलाकुसर हे त्याचे वैशिठ्य असून मंदिराचा गाभारा हा उत्तम कलाकुसर चा नमुना आहे .मंदिरात कालीकादेविच्या दोन मुर्त्या असून एक स्वयंभू मूर्ती आहे तर एक नंतरची असावी असे राजवाडे संशोधन मंडळ मधील अभ्यासक सांगतात ..(मुख्यता :मान वाकडी असलेली ) तरीही दोन्ही मुर्त्या ह्या कमीत कमी ८०० वर्षे जुन्या म्हण्तल्या जातात ..) तसेच दोन्हीही मुर्त्या बद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात ..मी स्वतः हे सर्व आठवण +राजवाडे संशोधन मंडळ मधील माहिती च्या आधारे लिहित असल्याने -काही गोष्टी चुन्याचा संभाव म्हणून अख्यैका च्या बाबत जास्त डीप जात नाही ..मुळात कालिकामाता है दैवत उग्र आणी तांत्रिक पूजेत जास्त वापरले जाते त्यामुळे एक मूर्ती हि शाक्त पंथीय असावी असे तर्क दिले जातात ..

#शाक्त..म्हणजे शक्तीचे उपासक ..अगदी शिवरायांच्या काळा पासून तांत्रिक निश्चलपुरी गोसावी आणी बाकीची तांत्रिक मंडळी हि समांतर अध्यात्मिक महत्व ठेवीत असत ..त्यांची स्वतंत्र उपासना पद्धत असे --ज्यात स्त्री ला केंद्र स्थानी मानून चक्र पूजा केली जात असे --आज हि अनेक्न्च्या घरात ४ -वर्षे -६ -१२ वर्षे नंतर चक्र पूजा केली जाते -ज्यांत माणसाचे सर्व गोत बोलाविले जात असे ..परंतु कालानुरूप शाक्य तंत्र पूजा हि ५ मंकार पद्धतीने केली जात असे ह्यात मैथुन हा भाग पण महत्वाचा असे -स्त्री ला प्रचंड महत्व यात दिले जाई !तर अशी देवता उग्र असल्या कारणाने तिथे एक सौम्य रुपात दुसर्या मूर्ती ची प्रतिष्ठापना केल्या गेली असल्याचा संभव आहे ..( मी स्वतः नाशिकच्या १८ व्या शतकातील सार्वजनिक वाचनालय भुयारात जे संग्रहालय आहे त्यात ..एक ओरीजनल तांत्रिक पुजेची छिन्न मस्ता रूपातील कालीची मूर्ती पाहिली आहे -ज्याला नरबळी दिल्या जायचा असे संशोधन करते म्हणतात )

भुयार :-हे गाव प्राचीन असल्यामुळे तिथे अनेक भुयार असल्याचा संभाव आहे -पूर्वी राजे महाराजे अश्या पद्धतीने भुयारातून निघून जात असत मंदिरा माग एक हल्ली सुकलेली विहीर आहे तिथे २ भुयारी मार्ग आहे -एक मार्ग सप्तशृंगी च्या डोंगरात निघतो तर एक पारोळ्याच्या भुईकोट किल्यात निघतो असे ग्रामस्थ फार पूर्वी माझ्याशी बोललेत..(तत्कालीन प्राचीन देवी मंदिराजवळ अशी भुयारे असणे खूपच कॉंमन गोष्ट होती ..चांदवड च्या देवी म्नंदिरात पण एक भुयार आहे तर - लळिंग किल्यावर पण एक भुयार डायरेक पान्झरा नदी किनारी निघते वैगरे लोक सांगीत असत..मुळात हे मंदिर गावाच्या तुलनेत थोडे उंच असल्या कारांरे इथे शास्त्रीयदृष्ट्या उत्खनन केले तर अधिक माहिती मिळू शकते असे लोक सांगतात ..तर गावकर्यांच्या मते गावात खोदकाम चालूं असताना एक भुयार आढळले होते असे संगीत ..तर १९६८ च्या पुरातव्त्व विभागाने खोदकाम केल्यावर महादेव मूर्ती आणी बाकी छोट्या मोठ्ठ्या मुर्त्या मिळाल्याचे समजले आहे ..

#विहीर - मंदिराच्या मागे एक विवहिर होती जी आता सुक्लीये -८० च्या दशकात मी तिला पाणी पाहिलेय तिच्यात काही तांब्या पितळेची भांडी सापडली होती -- गावात कोणाच्या घरी कार्य असले कि तो विहिरीत हाक मारून सांगे -पण पाण्यातून भांडे वर येत अशी स्थानिक दंत कथा मी एकून आहे ..त्या विहिरीतून २ भुयारी माग जात असत एक पारोळा चा किल्ला आणि एक सप्तशृंगी गड कडे जातो अशी दंत कथा साठ्निक लेव्हल ला सांगितली जाते ..!!1968 मध्ये पुरातत्त्व विभागाने उत्खनन केले, तेव्हा महादेव व इतर मूर्ती निघाल्यात. हे मंदिर गावापासून काहीशा उंचीवर आहे. उत्खनन बरीचशी माहिती मिळेल; परंतु संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.असो - बहुतेक माहिती मी खूप लहान असल्या पासूनची म्हणजे ८० आणि ९० च्या दशकातील आहे - निव्वळ एक माहिती देण्याचा प्रयत्न म्हणून मी दिला आहे -तर काही संदर्भ चुकू शकतात तर काही गोष्टी निव्वळ एकीव माहिती वर आहेत --धन्यवाद !!)

- संदर्भ -

धुळे जिल्हा ग्याझेट

राजवाडे इतिहास संशोधन मंडळ मधील विविध ग्रंथ

लोक दैवते आणि रथोत्सव .-डॉक्टर सर्जेराव भामरे

इतिहासातील दुय्यम साधने -प्रचलित लोक कथा +दंत कथा आणि गावकरी ह्यांच्याशी चर्चा .!

http://bholamilind.blogspot.com/

कानबाई- खान्देशातील एक प्रथा!

श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी या समाजात साजरा होतो.

या उत्सवाच्या आधीही दिवाळ सणाच्या आधी करतो तशी घराला रंगरंगोटी होते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. तेही चक्कीवालीला आधी सांगुन ( तो मग चक्की धुवुन पुसुन ठेवतो.) चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य. साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते. कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते.

'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक ..नदीवरुन पाणी आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता चाळीसगावजवळ उमरखेडला म्हणे कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात.

तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो.
Photo0731.JPG
काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात.
Photo0736.jpg

दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात. गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही.

Photo0764.jpg

नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो.

दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.
कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे.

परवाच कानबाईचे एक गाणे ऐकले. ते जसेच्या तसे इथे देत आहे.

डोंगरले पडी गई वाट,
वाट मन्ही कानबाईले|

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
साडी चोळीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ....

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
पुजा पत्रीना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
फुलेस्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई ...

कसाना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
रोटास्ना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई...

कसाना लऊ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
तोरणना लउ मी थाट
थाट मन्ही कानबाईले
डोंगरले पडी गई....

 

आईकडे कानबाई नेहेमी बसते. दरवर्षी पुरणपोळी, कटाची आमटी, लाल भोपळ्याची(डांगराची) भाजी, पापड, भजे आणि अजून काय काय असा साग्रसंगीत प्रसाद असतो तेव्हा. कानबाईचा मुखवटा तयार करणं पण कलेचं काम असतं. मुखवट्यासाठीची हळद एकदम पर्फेक्ट भिजली पाहिजे. जास्त फुगली पण नाही पाहिजे. दुसर्‍या दिवसापर्यंत तडा जाणार नाही इतकीच ओली लागते. आम्ही काळ्या उडदाच्या दाळीचे डोळे आणि कुंकू वापरून ओठ बनवतो. कानबाईचे वेगळे दागिने पण असतात.

आरास नुकतीच करून संपली आहे, तेव्हाचा हा फोटो:
kaanbaai.jpg

आमच्याकडंच्या कानबाईची सुरुवात झाल्यापासूनची एक मज्जा म्हणजे, प्रत्येकवर्षी त्याच दिवशी मुसळधार पाऊस होतोच होतो, आणि येणारा पाहुणा किमान १ तास उशिरा येतो. आणि काहीही करा, त्या रात्री लाईट जातातच जातात. आता तर युपीएससुद्धा बंद पडतो. किमान एका तासासाठी का होईना, पण तसा खोळंबा झाल्याशिवाय आम्हालाही चैन पडत नाही. Happy

दर्शनाला आलेल्या प्रत्येकाला आई प्रसादाचे जेवण देते (का ते देव जाणे, खरं तर तशी काही रीत नसते.) त्यामुळे चुलीपाशी पुरणपोळ्या करणार्‍या आम्हा सगळ्यांची कंबर पार मोडून निघते. पण घरभर पसरलेला तो पुजेचा-नैवेद्याचा वास, पावसाळी हवा, खोलीतला मेणबत्त्या-कंदिलाचा मंद प्रकाश, पुजेची ताटं घेऊन आलेली ओळखी-अनोळखी माणसं, त्यांच्या गडबडीत आपल्या घरच्या पाहुण्यांशी गप्पा-टप्पा, असा सगळा 'माहौल' तयार होतो.

मला लहानपणापासून काय आवडायचं ते म्हणजे कानबाईचं सर्व जातींतलं अस्तित्व! कानबाई सगळ्यांकडे बसते - कुठलाच भेदभाव करत नाही. जर तुमच्या घरी नसेल, तर त्या दिवशी तुम्ही कुठल्याही घरात जाऊन पुजू शकता. ओळख पाहिजेच असं पण नसतं. ऐन वेळी, न सांगता येणार्‍या सुवासनींनी आईला आवर्जून "बरं झालं बाई तुम्ही करता कानबाईचं... नाही तर मला संकटच पडलं होतं यावर्षीच्या पुजेचं.... निभावलं म्हणायचं. देवीच्या मनात असतं हो. ती करून घेते आपल्याकडून..." असं (बर्‍याचदा खांदेशी भाषा - अहिराणीमध्ये) म्हणणं, आईला किती समाधान देतं ते तिच्या चेहेर्‍याकडे पाहूनच कळतं. Happy शिवाय नंतरची ती कानबाईची गाणी, फुगड्या - धमाल असते अगदी!!!

 दुसर्‍या दिवशी नि तिसर्‍या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं.रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणीसुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात.>> हे सासूबाई कडून बरेचदा ऐक्लय..त्यामुळे आता त्या म्हणतात त्या मानाने आपण काहीच करत नाही.. इथे तर तयार कणिक मिळते त्यातूनच थोडी बाजूला काढून करावं लागतं

१५ दिवसांपुर्वी भावाकडे कानबाई झाली.
Kanbai- 2013
नविन काही गाणी मिळालीत जुन्या बायकांकडुन. Happy इथे टाकल्याशिवाय रहावत नाही म्हणुन टाकतेय.

१) घरधनीनी मंडप सवारा, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीनी शिवार रोखी, कथाईन जाशी मन्ही कानबाई माय
गावना मारुतीले शेंदुर नारय, कथाईन जाशी...
गावना पाटीलने दरजा (दरवाजा) रोखा, कथाईन...
गावना पाटीलले पान सुपारी, कथाईन जाशी...
घरधनीनी मंडप संवारा, कथाईन जाशी...
घरधनीना जयजयकार, तठेच राहसु वं माय!

२) हाऊ काय सरावन महीना वं माय
पान वार्‍यानं उडेल वं माय
आईच्या दरबारी पडेल वं माय
आईने शेल्याने झाकीले वं माय
आईचा सासरा दशरथ वं माय, सासरा दशरथ
आईनी सासु केगामती (कैकयी) वं माय
आईना राम भरतार वं माय, राम भरतार

३) सुर्या निंघना, कानडी (कानबाई) उभ्या, दारावरी
तापी गोमीना(गोमती नदी) मेळ देव चांग्यावरी
सुर्या निंघना...
डोकी तांबन्या घागरी भेट गंगेवरी

४) कानबाई सांगे रानबाईने
थारा कोठे लेशी वं माय
थारा लेसु वारा लेसु
... भाईना घर वं माय
... भाईनं सुर्यामुखी दार
याने बसनं ठाकं दारी वं माय
ठाकं दारी याने मंडप दिला भारी वं माय

५) सहा महिन्याची रात्र गेली, गेले होते कुठे गं
वाणियाच्या दुकानी मी बसलो होतो तिथे गं
नारळाच्या गोणी मी तो खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र...
वाणियाच्या दुकानी मी...
खारकाच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं
सहा महिन्याची रात्र गेली...
वाणीयाच्या दुकानी मी.....
लिंबोळ्याच्या गोणी मी तं खरेदी केल्या दोन्ही गं

गमभन... ही गाणी असच कानबाईसमोर बसुन आया-बाया म्हणतात. ताट वाजवत, सुप वाजवत कानबाईसमोर नाचतात.

वरच्या फोटोत केळीच्या खांबाला कण्हेरीच्या फांद्या बांधलेल्या दिसत आहेत. कण्हेरीच्या झाडाचं खान्देशात फार महत्व आहे. कण्हेर हीच कानबाई आहे असेही मानणारे लोक दिसतात.

http://www.youtube.com/watch?v=1o0s_LnEbIs
इथे घट्याची (जात्याची पुजा), प्रत्येकाची एक एक मुठ धान्य घेणे, धान्याची रास पुजा, पुरुषांनी जात्यावर दळण काढणं आणी मांडे करुन ते रोट कानबाईला नैवेद्य दाखवणे असे विधी दिसतील.
http://www.youtube.com/watch?v=6ZfOxe8bcM8
इथे कानबाईला नदीवर विसर्जनाला नेतांनाचा व्हिडीयो आहे.

या प्रदेशावर खानाचं राज्य होतं. गावोगावी असलेल्या भाऊबंदाना या निमित्ताने एकत्र आणणे हाच खरा उद्देश असावा, या सणामागे.

 

कृषी संस्कृतीशी नातं जोडणारा उत्सव!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

- संजय झेंडे'कानबाईचा देश तो खानदेश' अशी सर्वसामान्य मनाला चटकन पटणारी व्युत्पत्ती ज्या प्रमुख ग्रामदेवतेच्या नावावरून रूढ झाली, त्या कानबाई उत्सवाची सांगता याच आठवड्यात झाली. कानबाई , खानदेशभर जवळजवळ बहुतेक सर्व जातींमध्ये पूजली जाणारी प्रमुख ग्रामदेवता आहे.....................'खानदेश' नावाच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक प्रवाद आहेत. त्यावर विद्वानमंडळींचे अद्याप एकमत झालेले नाही. थेट इतिहासाचार्य राजवाड्यांच्या कालखंडापासून खानदेश नाम व्युत्पत्तीचे चर्वितचर्वण सुरू आहे. मात्र 'कानबाईचा देश तो खानदेश' अशी सर्वसामान्य मनाला चटकन पटणारी व्युत्पत्ती ज्या प्रमुख ग्रामदेवतेच्या नावावरून रूढ झाली, त्या कानबाई उत्सवाची सांगता याच आठवड्यात झाली. कानबाई, खानदेशभर जवळजवळ बहुतेक सर्व जातींमध्ये पूजली जाणारी प्रमुख ग्रामदेवता आहे. खानदेशच्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही कानबाईचा उत्सव होत नाही. कृषी संकृतीशी नातं अधोरेखित करणारा हा उत्सव आहे; यानिमित्ताने सर्वांना एकत्र आणून भाऊबंदीतून निर्माण होणारे हेवेदावे आणि वैरभाव विसरायला लावणारा आणि अनेक आक्रमणांनंतरही टिकून राहिलेला हा सांस्कृतिक वारसा आहे. खरंतर या पुरातन उत्सवास लाभलेली लोककथा, लोकगीते आणि दंतकथांची समृद्ध मौखिक परंपरा खानदेशच्या प्राचीन अस्पशीर् इतिहास संशोधनाचं सशक्त साधन होऊ शकते. मात्र त्यादृष्टीने या उत्सवाकडे पाहणाऱ्या संशोधकांची मात्र येथे वानवा आहे.गौरी-गणपतीचा उत्सव जवळ आला की दूरदूरवर पसरलेल्या मूळ कोकणवासीयांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. तशीच अवस्था खानदेशवासींची कानबाई उत्सवाच्यावेळी होते. श्रावण सुरू झाला की नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी खानदेशात कानबाईची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते.. चौरंगावर पूवीर् घडविलेल्या मुखवट्याची अथवा परणलेल्या नारळाची विधिवत स्थापना करण्यात येते. स्थानिक महिलांचा पेहराव व दागिन्यांच्या पद्धतीनुसार कानबाईला सजविण्यात येते. कानबाईचे लग्न लावण्याचा एक विधी यावेळी करण्यात येतो. पुढील चार दिवस कानबाईचे असतात. या उत्सवादरम्यान कुलाचारपद्धतीप्रमाणे कानबाईचे रोट केले जातात. त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कानबाईचे रोट करताना सव्वाशेर, अडीच शेर, सव्वा पायली या हिशेबाने गहू घेतले जातात. याव्यतिरिक्त घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू वाढविण्यात येतात. काही ठिकाणी गोठ्यातील पशूधनाच्या नावानेही पाच-पाच मुठींचा वरताळा घेण्यात येतो. ज्यांच्याकडे गहू नसतात तेथे बाजरीचे रोट करण्यात येतात. काही ठिकाणी सूयोर्दयापूवीर् सर्व स्वयंपाक तयार करतात. उगवत्या सूर्याचे पूजन करून खीर-पुरीचे जेवण सर्व भाऊबंद घेतात. त्यामुळे कानबाई आणि रोट हे कौटंुबिक सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. खानदेशचे वैशिष्ट्य असलेल्या खापरावरच्या पुरणपोळ्या आणि खानदेशी साजूक तूप या उत्सवाचा आनंद वाढवितात. तिसऱ्या अथवा चौथ्या दिवशी या उत्सवाची सांगता होते. वाजत गाजत गाणी म्हणत, फुगडी खेळत कानबाईची मिरवणूक नदीकाठी पोहोचते आणि कानबाई उत्सवाची सांगता होते. या उत्सवामागील धार्मिक भावना, नवस फेडण्यामागील दैववाद आणि उत्सवप्रियता यापलीकडे जाऊन आजच्या साथीच्या आजारांच्या काळात कानबाई उत्सव महत्त्वाचा वाटतो तो या निमित्ताने होणाऱ्या स्वच्छतेमुळे. श्रावणातील पहिल्या रविवारी कानबाई उत्सव सुरू होतो. मात्र गृहिणींची तयारी मंगळवार-बुधवारपासूनच सुरू होते. पूवीर्पासून कानबाई बसण्यापूवीर् गावातील, वाड्यातील प्रत्येक घर लिंपले जाते, पोतारले जाते. रंगरंगोटी केली जाते. घरातील लाकडाचे सरे, कड्या, खांब यांना गोमूत्र चोपडले जाते. घरातील सर्वांचे सर्व कपडे स्वच्छ धुतले जातात. गादी वगळता सर्व अंथरुण, पांघरुण धुऊन स्वच्छ केली जातात. अशा सजविलेल्या, शृंगारलेल्या व सुशोभित जागेवर कानबाईची प्राणप्रतिष्ठा होते. पुत्रप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्या महिलांना कानबाई अधिक भावते. त्या कानबाईची आराधना करतात. . .कानबाई माय, तुन्हा करसू वं 'रोट'खपी चालनी हयाती, पिकू देवं, मन्हं पोट कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी ऐकण्याचा आनंद अवर्णनीय आहे. अहिराणी भाषेचा गोडवा जाणून घ्यायचा असेल तर, आधी ही गाणी ऐकली पाहिजेत. कानबाईची परंपरागत तसेच धुळ्यातील विश्राम बिरारी, मंगला रोकडे आणि जगदीश देवपूरकर यांनी लिहिलेली नवीन गाणी व्हीसीडी व व्हीडिओ सीडीज्च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत. या गीतांना ऋचा बिरारी यांनी स्वरबद्ध केले आहे. केवळ श्रावणातच नव्हे तर लग्न सोहळ्यात नाचगाण्यांच्यावेळी ही गाणी हमखास वाजविली जातात. खानदेशचा ब्रॅण्ड उत्सव असलेल्या कानबाई उत्सवाबद्दल लिखित साहित्य मात्र फारसे उपलब्ध नाही. मालेगावचे डॉ. सयाजी निंबाजी पगार, अमळनेरचे कृष्णा पाटील, प्रा. डॉ. पुष्पलता करनकाळ यांसारख्या काही मोजक्या मंडळींचे कानबाईकडे लक्ष गेलेले दिसते.कानबाई हा खानदेशचे मूळ रहिवासी असलेल्या आहिरांचा मुख्य उत्सव आहे. या भूमीवर आभीरांचे आगमन नेमके कधी झाले? यदुवंशीय कृष्णाचे नेतृत्व मानणाऱ्या आभीरांचा या भागातील सत्ताकालखंड कोणता? आणि फारुकी राजवटीचा खानदेशवर प्रदीर्घकाळ अंमल असूनही येथील सांस्कृतिक परंपरांचा गाभा अबाधित राहण्याचे रहस्य कोणते? या अंगाने खानदेशचा इतिहास जाणून घेण्यासाठी कानबाई उत्सव हे प्रभावी साधन ठरु शकते. लोकसंस्कृतीची उकल करण्यासाठी या मौखिक खजिनाचा उपयोग होऊ शकतो. अगदी अलीकडे या साधनांचा वापर करून लोकइतिहासाची उभारणी करणारी शाखा देशविदेशांतील विद्यापीठांमध्ये मूळ धरू लागली आहे.प्राधिकरणाच्या निवडणुकीच्या निमित्ताने विद्यापीठाच्या आवारात होणाऱ्या मारामाऱ्या आणि त्यासाठी पोलिस ठाण्यापर्यंत करावी लागणारी धावपळ यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तूर्त संशोधनाच्या आधुनिक साधनांचे प्रवाह स्थिरावणे कठीण दिसते. अशा वेळी समाजातील संशोधनवृत्तीच्या नागरिकांनीच या कामामध्ये स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

 

श्री कानबाई माता (कानुमाता) उत्सव

श्री कानबाईमाता (कानुमाता) उत्सव

        खान्देशच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात श्री कानुमातेच्या उत्सवास मोठे मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा आहे. श्री कानुमातेचा उत्सव दर वर्षी श्रावण महिन्यात शुद्ध पक्षात साजरा केला जातो. नागपंचमी नंतर येणार्‍या पहिल्या रविवारी श्री कानबाई मातेचा उत्सव केला जातो. नागपंचमी नंतरचा रविवार हाच दिवस निश्चित असल्याने पूजेसाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं, हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी ‘कानबाई’ हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, पाटील, इ. समाजात आणि प्रामुख्याने खान्देशात साजरा होतो.

        परंपरेने चालत आलेल्या व कायमस्वरूपी जतन केलेल्या श्रीफळ रूपातल्या श्री कानबाई (कानुमाता) आणि श्री रानबाई (राणुमाता) अशा जोडीने या देवीची पूजा-अर्चना केली जाते. काही कुटुंबांमध्ये हातापायाची कानबाई असते तर काहींकडे कानबाई-रानबाई अशा दोन्ही देवी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. काहींकडे देवीच्या चौरंगावर छोटा मांडव घालतात. परंतु या सर्व पद्धतीत देवीचे हे परंपरागत श्रीफळ/नारळ हा या उत्सवाचा महत्वाचा गाभा आहे. या श्रीफळांचा वर्षोनुवर्षे अतिशय काळजीपूर्वक सांभाळ केला जातो. हे श्रीफळ कालांतराने जीर्ण झाल्यास, हाताळणे कठीण झाल्यास त्यास नवरूप द्यावे/नूतनीकरण करावे (परणून आणणे असे या विधीचे नाव आहे, सविस्तर माहिती पुढील लेखात).

        या उत्सवाच्या आधीही दिवाळीसणाच्या आधी करतात तशी घराची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट करतात. घरातील सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ केली जातात. पडदे, चादरी, इ. सगळे स्वच्छ धुवून घेतात. देवघरातील सर्व देव घासून पुसून लख्ख स्वच्छ चकचकीत करतात, हार – फुले यांची सजावट करतात. एकूणच, सर्व घर, वातावरण  देवीच्या आगमनासाठी स्वच्छ पवित्र सुसज्ज करतात.

रोट

        कानबाईच्या उपासनेत ‘रोट’ या विधीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कानबाईचे रोट हा एक महत्त्वपूर्ण कुळाचार आहे. रोट म्हणजे देवीच्या पूजेसाठी घरातील सर्व भाऊबंदांच्या नावाने मोजून घेतले जाणारे गहू, आणि त्याचा प्रसाद. हा रोटांचा प्रसाद केवळ सुतकी भाऊबंदांनी ग्रहण करावा. यावेळी घरात उपस्थित असलेल्या लग्न झालेल्या मुली व इतर नातलग/मित्र-मंडळी यांना हा प्रसाद ग्रहण करता येत नाही (दुसर्‍या कुळातील असल्याने), त्यांच्यासाठी स्वतंत्र स्वयंपाक करतात.

        रोट हे कुठल्याही परिस्थितीत श्रावण पौर्णिमेच्या आधी संपवायचे असतात. तसेच रोट संपण्यापूर्वी, ‘रोटाचा वाढवा’ म्हणून एक छोटा विधी करून मगच संपवले जातात. ‘रोटाचा वाढवा’ म्हणजे रोट थोडे शिल्लक असताना तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवून मग रोट संपवावे. रोटाचा वाढवा तिसर्‍या दिवशी (म्हणजेच लगेचच्या बुधवारी – कानबाई बसवण्याचा रविवार हा पहिला दिवस पकडून) करता येत नाही. रोट तिसर्‍या दिवशी संपत आहेत असे लक्षात आल्यास, रोट जाणीवपूर्वक उरवून/शिल्लक ठेवून मग चौथ्या दिवशी संपवावेत. रोट बाहेरगावी नेता येत नाही. रोट गायीला खाऊ घालता येत नाही. रोट केवळ सुतकी भाऊबंदांनीच खायचे असतात. घरी येणार्‍या पाहुण्यांसाठी, विवाहित मुलींसाठी, वेगळा स्वयंपाक करतात, त्यांना रोटाचे पदार्थ देत नाहीत.

        रोट संपेपर्यंत जेवून हात धुतलेलं पाणी, उष्ट्या खरकट्या ताटातील पाणी सुद्धा सांभाळून विसर्जित करतात. एखाद्या झाडाजवळ / कोपर्‍यामध्ये, कोणाच्या पायदळी येणार नाही अशा बेताने एक मोठा खड्डा करुन त्यात हे सर्व पाणी ओततात, त्यास ‘समुद्र’ असे म्हणतात. काहीही उष्टे, खरकटे गटारीत / मोरीत / बेसिन मध्ये किंवा इकडे तिकडे पडू देत नाहीत. आपले उष्टे/खरकटे तुळशीला विसर्जित करू नये. रोट संपेपर्यंत हा नियम काळजीपूर्वक  पाळावा.

        काही कुटुंबांमध्ये देवीचे नारळ आणि त्यांची पूजा असा प्रकार नसतो, केवळ रोटांची पूजा असते. अशी मंडळी सामान्यप्रमाणेच रोट बनवून, जवळपास ज्या घरी कानबाईची पूजा असेल तिथे जावून देवीसमोर ते रोट पूजतात, रोटांचा नैवेद्य दाखवतात. बाकी रोटांचे नियम सारखेच असतात.

रोट मोजण्याची पद्धत –

  • कानबाईमाता पूजेच्या रविवारी सकाळी, घरातील कर्त्या सुवासिनीने शुचिर्भूत होऊन देवपूजा करावी. कुलदेवतेची पूजा करावी.
  • कुटुंबात वंश परंपरेने चालत आलेल्या मापाप्रमाणे गहू मोजून घ्यावे. हे माप सव्वा या प्रमाणात असते (सव्वा शेर, सव्वा पाव, इ). (आपल्या विभांडिक कुटुंबात सव्वा पाव मापाचा रोट असतो).
  • त्यानंतर देव, कानबाई, रानबाई, गाय-वासरू, गुरव यांच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू मोजून घ्यावे.
  • कुटुंबात रोटांची ज्याप्रमाणे वाटणी झाली असेल त्या प्रमाणे कुटुंबातील सर्व लहान मोठ्या जीवित पुरुषांच्या नावाने प्रत्येकी पाच मुठी गहू मोजून घ्यावे.
  • सर्वांच्या नावाने प्रत्येकी ५ मुठी गहू मोजून झाल्यावर, चुकीने एखादे नाव सुटल्याची शक्यता गृहीत धरून आणखी ५ मुठी गहू घ्यावेत.
  • मोजलेल्या गव्हामध्ये आंब्याच्या पानावर देवीचे टाक ठेवून पूजा करावी. गणपतीची, देवीची आरती करावी. नैवेद्य दाखवावा.
  • हे मोजलेले गहू चक्कीवरुन दळून आणावे.
  • हे गहू आणि त्याच्या पोळ्या / पुरणपोळया यांनाच पूर्ण पूजा संपेपर्यंत रोट असे म्हणतात.
  • रोटाचे गहू दळून आणल्यानंतर सर्व उपस्थित भाऊ-बंदांना पुरेशा होतील या प्रमाणात रोटाच्या पुरणपोळया कराव्यात.
  • या पुरणपोळ्यांची एक चळत नैवेद्य आणि पूजेसाठी बनवून ठेवावी.

पूजाविधी

साधारणत: सूर्यास्ताच्या थोडा वेळ आधी पूजा मांडण्यास सुरवात करावी. स्वच्छ धुतलेला चौरंग घ्यावा. त्यावर स्वच्छ खण अंथरावा. चौरंगाला केळीचे खांब बांधावे. कण्हेरीच्या डहाळ्या (छोट्या नाजूकशा पांनांसहित फांद्या) लावाव्यात. हार फुले समई धूप दीप इ. यांची सजावट करावी. सनई/इतर मंगलवाद्ये लावून वातावरण मंगलमय करावे. प्रवेशद्वारी सडा-रांगोळी, आंब्याचे तोरण, आंब्याच्या डहाळ्या, कण्हेरीच्या डहाळ्या, रोषणाई/लाईटिंग, पताका इ. यथाशक्ती करावे. वातावरण आनंदी, उल्हसित, मंगलमय करावे.

  • सर्वप्रथम पूजा मांडणी करणार्‍या व्यक्तीने शुचिर्भूत होऊन (व जमल्यास सोवळे नेसून) देवाला नमस्कार करावा, घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करावा आणि मग देवीची पूजा मांडण्यास सुरवात करावी.
  • चौरंगावर पूजा करणार्‍याच्या उजव्या बाजूस थोडे तांदूळ ठेवावे, त्यावर कलश ठेवावा. कलशात स्वच्छ पाणी भरून, रुपया सुपारी टाकावी. कलशावर ५ विड्याची पाने मांडावीत. कलशाला लाल गंधाची पाच बोटे लावावीत.
  • परंपरागत कानबाईच्या नारळाला प्रथम शुद्धोदक, मग पंचामृत, परत शुद्धोदक याप्रकारे स्नान घालावे.
  • नारळाला हळद कुंकवाचा टिळा लावून खण, मंगळसूत्र, नथ, डोळे, कानातले, शेवंतीची वेणी, इ साज-शृंगार करून कलशावर कानबाईरूपी नारळाची स्थापना करावी.
  • कानबाईच्या उजव्या बाजूला म्हणजेच पूजा करणार्‍याच्या डाव्या बाजूला श्री रानबाई मातेची स्थापना वरील प्रमाणेच करावी.
  • रानबाई मातेची स्थापना कलशावर करत नाही. त्याऐवजी थोडे तांदूळ चौरंगावर ठेवून त्यावर रानबाईमातारूपी नारळाची स्थापना करावी. हळद कुंकवाचा टिळा लावून खणाचे वस्त्र, मंगळसूत्र, नथ, डोळे, कानातले, शेवंतीची वेणी, इ साज-शृंगार करावा.
  • दोन्ही देवींच्या समोरील जागेत, चौरंगाच्या मध्यभागी विडयाची पाने ठेवावीत. त्यावर एका बाजूला (देवीचे टाक मध्यभागी ठेवता येतील अशा बेताने), रुपया आणि त्यावर सुपारी अशा स्वरुपात गणेशाची स्थापना करावी. देवीचे टाक ठेवण्यासाठी जागा मोकळी सोडावी.
  • देवीचे टाक ताम्हणात घेऊन त्यांना प्रथम शुद्धोदक, मग पंचामृत, परत शुद्धोदक याप्रकारे स्नान घालावे.
  • देवीचे टाक पुसून विड्याच्या पानांवर ठेवावेत. हळद कुंकू अक्षता फुले धूप दीप यांनी पूजा करावी.
  • देवीजवळ खोबर्‍याच्या वाटीत गुळाचा खडा ठेवून त्याचा नैवेद्य दाखवावा.
  • देवीजवळ काकडी, केळी, लिंबू हे देवीचे आवडते पदार्थ ठेवावेत.
  • काही ठिकाणी हौस म्हणून देवीला बाजारातील तयार मुखवटयांची सजावट केली जाते. (आपल्या विभांडिक कुटुंबात या प्रकारची कोणतीही पूर्वापार प्रथा नाही, त्यामुळे अशा प्रकारची मुखवटयांची सजावट करून नवीन प्रथा निर्माण करू नयेत).
  • काही ठिकाणी देवीला खोबर्‍याच्या वाट्यांची माळ करायची पद्धत आहे. (आपल्या विभांडिक कुटुंबात या प्रकारची कोणतीही पूर्वापार प्रथा नाही, त्यामुळे अशा प्रकारची माळ लावून नवीन प्रथा निर्माण करू नयेत).

  • वरीलप्रमाणे सर्व पूजा मांडणी झाल्यावर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथातील देवीची पुढील स्तोत्रे, पाठ, इ. यथाशक्ती पठण करावे.
            • श्रीदेव्यथर्वशीर्षम्
            • अथ देव्या: कवचम्
            • अथार्गलास्तोत्रम्
            • देवीसूक्तम्
            • सिद्धकुञ्जिकास्तोत्रम्

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ घरात उपलब्ध नसल्यास पुढे दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करून घेऊ शकतात – श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ डाऊनलोड

  • रोटांच्या नैवेद्याचे ताट देवीपुढे मांडून ठेवावे. ताटातील दिवे प्रज्वलित करावेत. (नैवेद्याच्या ताटाच्या मांडणीची माहिती पुढे दिली आहे).
  • यानंतर गणपतीची आणि देवीची आरती करावी. कर्पूरारती, मंत्रपुष्पांजली करावी.
  • रोटांचा नैवेद्य दाखवावा. देवीचे आवडते पदार्थ – ज्वारीच्या लाहया, फुटाणे आणि काकडी यांचाही नैवेद्य दाखवावा. देवीस श्रीफळ वाढवावे.
  • सर्व उपस्थितांनी देवीची मनोभावे पूजा करावी.
  • देवीसमोर फुगड्या, देवीची गाणी, स्तोत्र पठण, मंत्र जप, इ करून आनंदोत्सव साजरा करावा.
  • दर्शनासाठी आलेल्या सर्वांना ज्वारीच्या लाहया, फुटाणे आणि काकडीचा प्रसाद द्यावा.

रोटांचा नैवेद्य

देवीची यथासांग पूजा, आरती झाल्यावर देवीला रोटांचा नैवेद्य दाखवला जातो.

  • नैवेद्य दाखवण्यासाठी रोटांच्या पुरणपोळयांची चळत एका मोठ्या ताटात (काशाचे ताट असल्यास उत्तम) मध्यभागी ठेवतात.
  • त्यावर कणकेचे मोठे दिवे पुढील बाजूस ठेवून त्यात फुलवाती लावतात. तसेच खोबर्‍याच्या पसरट वाट्यांमध्ये फुलवाती ठेवून त्यांचेही दिवे बनवतात व कणकेच्या दिव्यांमागे ते ठेवतात. दिवे प्रज्वलनासाठी शुद्ध तूप वापरावे, तेल/डालडा वापरू नये.
  • देवीच्या नैवेद्यासाठी भात, कटाची आमटी, गंगाफळाची (लाल भोपळा) भाजी, हरभर्‍याच्या डाळीचे फुनके (याला या पूजेच्या दिवशी नारळ असे म्हणतात), तांदळाची खीर, तळण (भजी, पापड, कुरडाइ, इ) करतात.
  • लहान वाट्यांमध्ये केलेल्या स्वयंपाकातील प्रत्येक पदार्थ ठेवतात. सोबत तुपाची वाटी ठेवतात.
  • एकूण सर्व मांडणी खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे असते.

  • पूजा झाल्यावर जेवणाचे वेळी नैवेद्याच्या ताटातील भात, आमटी, भाजी, तळण, फुनके (नारळ), इ सर्व पदार्थ वाढून घ्यावेत. नैवेद्याच्या ताटात काही रोट शिल्लक ठेवून बाकी रोट भाऊ-बंदांमध्ये वाढून द्यावे. जेवून झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.
  • घरातील सर्वांची जेवणे होईपर्यंत कणकेचे दिवे आणि खोबर्‍याच्या वाटीचे दिवे प्रज्वलित राहतील याची काळजी घ्यावी. त्यासाठी दिव्यांमध्ये योग्य प्रमाणात तूप वापरावे. (बर्‍याचदा खोबर्‍याच्या वाट्या दिव्याच्या उष्णतेमुळे जळतात, पेट घेतात, त्यावेळी जाळलेल्या भागावर पुरणाचा गोळा ठेवून वाटीला लागणारी आच कमी करता येते.)
  • रोटांवरील चारही दिवे शांत झाल्यावर नैवेद्याच्या ताटात शिल्लक ठेवेलेले रोट आणि दिवे देवीजवळच व्यवस्थित झाकून ठेवावेत.
  • दुसर्‍या दिवशी घरातील कर्त्या सुवासिनीने शुचिर्भूत होऊन देवपूजा आटोपून झाकून ठेवलेले रोट आणि कणकेचे दिवे यांचा चुरमा करावा. हा चुरमा घरातील भाऊ-बंदांमध्ये आवडीनुसार दूध/दही यासोबत वाटून खावा. खाऊन झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.

विसर्जन

रविवारी संध्याकाळी देवीचे आपल्या घरी आगमन झाल्यावर दुसर्‍या दिवशी सोमवारी देवीचे विसर्जन असते. शक्यतो सकाळी मध्यान्हपूर्वीच देवीचे विसर्जन करतात.

  • घरातील कर्त्या जोडप्याने लवकर शुचिर्भूत होऊन दैनंदिन देवपूजा करावी.
  • वर सांगितल्याप्रमाणे, आदल्या दिवशी देवीजवळ झाकून ठेवलेले रोट आणि कणकेचे दिवे यांचा चुरमा करावा. हा चुरमा घरातील भाऊ-बंदांमध्ये आवडीनुसार दूध/दही यासोबत वाटून खावा. खाऊन झाल्यावर हात धुतलेले पाणी, खरकटे पाणी एका खड्ड्यात (समुद्र) विसर्जित करावे.
  • नैवेद्यासाठी थोडा भात शिजवून त्यावर दही ठेवून नैवेद्य तयार करावा.
  • विसर्जनासाठी देवीचा चौरंग स्थापना केल्या जागेपासून ५-१० पावले पुढे सरकवावा. देवीची आरती करावी, नारळ वाढवावा.
  • त्यानंतर विसर्जनाला निघण्यासाठी देवीचा चौरंग एका सुवासिनीच्या डोक्यावर ठेवावा. सुवासिनीची ओटी भरावी. देवीसमोरून लिंबू कापून ओवाळून टाकावे. विसर्जन मार्गात घागरीने पाणी टाकत विसर्जनासाठी निघावे.
  • देवीचे विसर्जन पूर्वीच्या काळी नदीवर केले जात असे, परंतु कालानुरूप काही व्यावहारिक अडचणींमुळे विसर्जन जवळपासच्या विहिरींवर, घरच्या अंगणात असे होऊ लागले. असो, कालाय तस्मै नम:
  • देवीचा गजर करत, फुगड्या खेळत, नाचत गात वाजत गाजत देवीला विसर्जन स्थळाकडे मार्गक्रमण करावे. देवीचा चौरंग आळी पाळीने एकेका व्यक्तीने आपल्या डोक्यावर घेऊन चालत राहावे. देवीसमोरील रस्त्यात पाणी टाकत राहावे, अधून मधून लिंबू कापून देवीवरून ओवाळून टाकावे.
  • विसर्जन स्थळापूर्वी ‘विसावा’ घेण्याची पद्धत आहे. म्हणजेच एखादा चौक, तिठा अशा ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही अशा रीतीने बाजूला थांबून देवीचा चौरंग डोक्यावरुन खाली उतरवावा. देवीची आरती करावी, प्रसाद वाटावा. आणि परत विसर्जन स्थळाकडे मार्गक्रमण करावे.
  • विसर्जनस्थळी पोहोचल्यावर चौरंगाला लावलेले केळीचे खांब, इतर पूजापत्री काढून बाजूला ठेवावी, आणि नंतर नदी/तलाव/निर्माल्य विसर्जन कलश, इ ठिकाणी सोडावीत.
  • देवीचे दागिने, साज-शृंगार काढून देवीच्या नारळांना, देवीसमोर ठेवलेल्या देवीच्या टाकांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
  • देवीच्या कलशातील पाणी पायदळी जाणार नाही अशा रीतीने एखाद्या झाडाजवळ विसर्जित करावे. कलश स्वच्छ धुवून परत नवीन पाण्याने भरून घ्यावा.
  • कलशाखालील तांदूळ, आणि रानबाई खाली ठेवलेले तांदूळ व्यवस्थित गोळा करून सांभाळून बाजूला काढून घ्यावे. या तांदळाची नंतर खीर करून सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावी.
  • चौरंगही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.
  • परत पूर्वीप्रमाणे देवीची मांडणी करावी, देवीला साज-शृंगार करावा. देवीची आरती करावी.
  • आरती झाल्यावर देवीला डोक्यावर घेऊन घरी परत यावे. अशा प्रकारे देवीचे विसर्जन होते.
  • घरी परत आल्यावर देवीचे टाक नेहमीप्रमाणे देवघरात स्थानापन्न करावेत. कलशातील पाणी तुळशीस टाकावे. देवीचे नारळ स्वच्छ कोरडे करून, एका वस्त्रात थोड्या तांदुळासोबत गुंडाळून सुरक्षित जागी ठेवावेत. ते खराब होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. देवीचा साज-शृंगार सांभाळून ठेवावा.

अशा प्रकारे अत्यंत आनंदात, उत्साहात श्री कानुमातेचा दोन दिवसाचा उत्सव संपन्न होतो. विसर्जन झाल्यावर खरोखरीची एक पोकळी जाणवते. देवीच्या आगमनाने उल्हसित असलेले वातावरण विसर्जनानंतर अचानक रिक्त वाटू लागते. आणि राहतात मग फक्त आठवणी आणि परत पुढच्या वर्षी देवी लवकर परत यावी ही विनवणी देवी चरणी…

बोला… कानबाईमाता की…जय…. रानबाईमाता की…जय….  

 https://www.shree-dnyanopasana.cf/shree-kanbai-mata-utsav/



No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...