ऐतिहासिक ‘महाराष्ट्र’
१ मे ,१९६० रोजी भाषेच्या आधारावर
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यासाठी झालेला लढा आपल्याला
माहित आहेच. परंतु महाराष्ट्र राज्याचा इतिहास किती मागे जातो,याचा विचार
करायचा म्हटले तर सर्वसाधारणपणे आपल्या समोर शिवाजी महाराज, पेशवे हे सगळं
डोळ्यासमोर उभे राहाते. त्या आधी इथे होऊन गेलेल्या साम्राज्यांची तितकीशी
ओळख नसते. तेच मांडण्याचा हा एक प्रयत्न…
‘महाराष्ट्र’ या
नावाने प्रसिद्ध असलेले आपले राज्य खूप प्राचीन काळापासून या नावाने ओळखले
जाते. अर्थात त्यावेळी त्याचा भौगोलिक विस्तार किती होता याविषयी विविध मते
आहेत. प्राचीन काळात रट्ठ नावाची एक जमात येथे राहत होती. त्यांच्या
पराक्रमामुळे ते ‘महारट्ठ’ (महान रट्ठ) म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे या
शब्दाचा अपभ्रंश होत होत ‘महाराष्ट्र’ नाव झाले असावे अशी एक समजुत आहे.
तसेच ‘महाराष्ट्र’ हा उल्लेख इतिहासात इसवी सन दुसऱ्या शतकापासून मिळाला
आहे,असेही मानण्यात येते. इसवी सन सातव्या शतकात भारतभेटीवर आलेल्या
ह्युआन श्र्वांग या चिनी मुसाफिराच्या पुस्तकात महाराष्ट्राचा संदर्भ आला
आहे.हे झाले ‘महाराष्ट्र’ या नावाबद्दल.पण अश्म युग,ताम्रपाषाण युग इतक्या
प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्राचे अस्तित्व असल्याचे पुरातन संशोधनातून
समोर आले आहे. संशोधकांना महाराष्ट्रात अनेक पुरातन जागा मिळाल्या आहेत.
महाराष्ट्र
हा ‘कणखर देशा, दगडांच्या देशा’ असाच ओळखला जातो. महाराष्ट्राच्या
भूतकाळातील पहिले पान म्हणजे अश्मयुग (पाषाणयुग).अश्मयुग या नावातच त्याचा
अर्थ दडलेला आहे. अश्मयुग (stone age) म्हणजेच मानवाच्याविकासाचा
प्रथमाध्याय होय ! या काळातील माणूस भटक्या अवस्थेत होता. नदी हीच त्याची
जीवनदायिनी. नदीकाठी वास्तव्य करुन आपल्या आजुबाजुला उपलब्ध असलेल्या
दगडांपासून तो हत्यारे तयार करीत असे. महाराष्ट्रातील बोरी येथे काही
अश्मयुगीन हत्यारे टेफ्रा (ज्वालामुखीची राख) वर मिळाली होती. वैज्ञानिक
तपासानुसार ही राख १.४ दशलक्ष वर्षांपूर्वीची असल्याने तिथे सापडलेल्या या
वस्तू अश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तांबे या धातुचा
शोध लागला. या कालावधीला पुरातत्त्व शास्त्रज्ञ ताम्रपाषाणयुग असे
संबोधतात. महाराष्ट्रातील दायमाबाद, सावळदा, इनामगाव व अश्या अनेक ठिकाणी
उत्खननात तांबे व त्याबरोबरच त्या काळात वापरली जाणारी मातीची खापरे आणि
इतर काही वस्तू व वास्तु संशोधकांना मिळाल्या. याचबरोबरीने शेतीसंस्कृतीचा
उदय ही महाराष्ट्रात झाला होता. मुळातच अनेक नद्यांमुळे ही भूमी सुपीक आहे.
त्यामुळे इथल्या नद्यांच्या प्रदेशात हा माणूस शेतीसाठी स्थिरावला.पुढे
‘लोखंड’ या धातूशी मानवाची ओळख झाली. साधारणतः हा काळ इ.स. पूर्व १२००
पासून सुरु झाला असं म्हणतात. ‘लोह’ हा माणसाच्या आयुष्यातला एक अतिशय
महत्त्वाचा असा शोध ठरला. महाराष्ट्रातील विदर्भ भागात जमीनी खाली लोखंडाची
काही हत्यारे, व इतर वस्तू संशोधकांना सापडल्या. त्याच बरोबर नायकुंड ह्या
नागपुर जवळ असलेल्या गावात लोखंडाची काही हत्यारे व चिकणमातीपासून बनवलेली
लोह भट्टी मिळाली.त्याचबरोबर संशोधकांना ‘megalithic burial ‘ (प्राचीन
काळी काही जमातींमध्ये माणूस मृत्यू पावल्यावर त्याला ज्या जागी पुरले
जायचे तेथे मोठे मोठेदगड रचून ठेवले जायचे) चे काही अवशेष ही मिळाले. त्याच
प्रमाणे माहुर्झरी, जूनापाणी,इत्यादी ठिकाणी बरेच महत्त्वाचे शोध लागले.

यानंतर उदयास आला तो ऐतिहासिक काळ. या काळात लिखाण अस्तित्त्वात आले. विविध साहित्य लिहिले गेले.त्यामुळे या काळाला पुरातत्त्व संशोधनात वेगळे महत्त्व आहे. हा काळ म्हणजेच बुद्ध आणि महावीर यांचा काळ. इसवी सन पूर्व ६०० पासून या काळाची सुरुवात झाली असावी असे मानण्यात येते. याच काळात विविध साम्राज्य अस्तित्वात आली.ज्यावेळी भारतभर विविध प्रदेशात अनेक राजे राज्य करत होते त्यावेळी महाराष्ट्रात सुद्धा शक्तिशाली साम्राज्ये निर्माण झाली. व्यापारी केंद्राचे मुख्य ठिकाण ‘शुर्पारक’ (आताचे नालासोपारा), येथे इ. स. पुर्व ३ ऱ्या शतकात सम्राट अशोकाने धर्मप्रचारासाठी मौर्य ब्राम्ही लिपीत लिहिलेला शिलालेख प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक काळात अनेक राजवटींनी या प्रदेशावर आपली सत्ता गाजवली. इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पहिले यामध्ये सातवाहन साम्राज्य महाराष्ट्रात प्रबळ होते. प्रतिष्ठान (आताचे पैठण) हे त्यांचे राजधानीचे ठिकाण होते. या कालखंडात कार्ले, भाजे, कान्हेरी, बेडसे या सगळ्यात प्राचीन समजल्या जाणाऱ्या बौद्ध गुंफा कोरल्या गेल्या.याच साम्राज्यातील राजा श्री सातकर्णी ह्याची राणी नागणिका हिने अखंड भींतीवर कोरलेला शिलालेख हा एक महत्वाचा ऐतिहासिक दुवा संशोधकांना नाणेघाट येथे सापडला आहे. त्यावरून त्या काळातील सातवाहन राजे, देव ,व्रते ,दानधर्म आणि समाजातील धार्मिक बाबींचा उलगडा झाला. याच लेणीत एक प्रतिमागृह असल्याचे ही कळते व त्या भग्न प्रतिमांखाली राजांची नावे देखील कोरलेली आहेत. गौतमीपुत्र सातकर्णी हा या घराण्यातील महान राजा होऊन गेला. एका शिलालेखात ‘त्रि समुद्र तोय पित वाहना’ ( ज्याचा घोडा तीन समुद्राचे पाणी प्यायला आहे ) असा उल्लेख या राजाबद्दल केला आहे.या वरूनच सातवाहनांचा प्रभाव दिसून येतो.


इसवी सन २५० – ५०५ दरम्यान वाकाटक राजवटीने राज्य केले. विदर्भातील
नगरधन ( पूर्वीचे नंदीवर्धन) ही यांची राजधानी असल्याचे पुरावे सांगतात आणि
येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन ही झाले. मन्सर, रामटेक, वाशीम, पौनार,
मांढळ, कौदिन्यपूर ही या राजवटीची काही महत्वाची स्थाने होती.त्याचवेळी
उत्तरेस गुप्त घराणे हे सुद्धा प्रभावशाली होते.राजा चंद्रगुप्त दुसरा,
याची कन्या प्रभावतीगुप्त ही वाकाटक घराण्याची सून झाली आणि ह्या दोन
राजवटींचे एकमेकांशी संबंध जोडले गेले. या संबंधातून गुप्त घराण्याच्या
धार्मिक विचारांचा वाकाटकांवर पगडा दिसून आला. राणी प्रभावती हिच्या
शिलालेखांतून हे दिसून येते. शिवभक्त असणाऱ्या वाकाटकांनी पुढील काळात
नरसिंह,वराह यांची मंदिरे बांधली.
स्थापत्यकलेच्या जडणघडणीत हा एक
महत्वाचा काळ मानण्यात येतो. वाकाटक घराण्यातील हरिशेन राजा याच्या काळात
अजिंठा लेणीचे काम जोमाने सुरु झाले.अनेक प्राचीन हिंदू मंदिराचे बांधकाम
या काळातील असल्याचे दिसून येते.
याशिवाय अनेक महत्वाच्या राजघराण्यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत वाटा
होता. चालुक्य, राष्ट्रकूट,कलचुरी,शिलाहार, यादव यांचा समृद्ध काळ
महाराष्ट्राने अनुभवला. घारापुरी (एलिफंटा)लेणी, अंबरनाथ शिवालय, कोपेश्वर,
देवगिरी अशी अनेक स्थाने या समृद्धीची प्रतीके म्हणून ओळखली जातात.याशिवाय
महाराष्ट्र प्रदेशाबाहेरील मौर्य ,गुप्त, मुघल राजवटीसारख्या अनेक
राजवटींचा प्रभावही इथे दिसून आला.त्यानंतर मग आपल्या सर्वांच्या परिचयाचा
असा मराठे आणि पेशवे यांचा काळ सुरु झाला.
एकूणच महाराष्ट्राचा ऐतिहासिक कालखंड विविधप्रकारे भारत आणि जगाच्या इतिहासाचा अभ्यास करताना मोलाची भूमिका बजावतो.

माहिती संकलन आणि सर्व छायाचित्रे : ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन : स्वाती भट
भारतातील पुरातत्त्व संशोधनाचा प्रवास..
पुरातत्त्व म्हणजे नक्की काय व त्याचा अभ्यास कसा असतो हे आपण गेल्या भागात वाचले. पण हे पुरातत्त्व संशोधन सुरू कधी झाले? विशेषतः भारतात त्याचा उगम कसा झाला हे वाचूया या भागात.
पुरातत्त्व संशोधन भारतात कधीपासून सुरू झाले याचा विचार करत असताना
आपल्याला मुख्यतः तीन कालखंड लक्षात घ्यावे लागतात.एक ब्रिटिश भारतात
येण्यापूर्वी,दुसरा ब्रिटीश साम्राज्य असताना आणि तिसरा
स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत. ज्या मुलखावर राज्य करायचे त्याची संपन्न
संस्कृती आणि इतिहास माहित असेल तर कारभार करणे सोप्पे होईल हा उद्देश
पहिल्या दोन्ही कालखंडात होता.
भारतात ब्रिटिश राजवट सुरू होण्याआधी जे राजे होऊन गेले त्यांनी ऐतिहासिक
साहित्य, दस्तऐवज, वास्तू यामध्ये रस दाखवला होता. अकबर आणि समकालीन
राजांनी रामायण, महाभारत अशा प्राचीन ग्रंथाचा अभ्यास केला होता आणि तसेच
या ग्रंथांची विविध भाषांतरे करून वेगवेगळ्या देशांत प्रसिध्द केली.
या कालखंडात त्याला संशोधनाचे स्वरूप आले नव्हते. तर ते केवळ आवड व
उत्सुकता म्हणून केले जात होते. परंतु एक संशोधनाची शाखा म्हणून
‘पुरातत्त्व’ अभ्यास ब्रिटिशांनी भारतात आणला. सुरुवातीला लागलेले काही शोध
हे अचानकपणे लागलेले होते. त्यामध्ये ठराविक उद्दिष्ट ठेउन शोध सुरू केला
नव्हता. बांधकामे सुरू असताना, रस्ते खणताना काही नाणी, प्राचीन वस्तू
सापडल्या. त्यानंतर प्राचीन साहित्यावर अभ्यास सुरू झाला. पौराणिक कथा आणि
त्यात असलेले संदर्भ यावर संशोधन सुरू झाले.हस्तिनापूर, अवंती,
कोसंबी,पाटलीपुत्र वगैरे शहरांचा कथांमधील उल्लेख आल्याने ही शहरे
शोधण्याच्या उद्देशाने पुढे अभ्यास सुरू होता. त्या दरम्यान कलकत्ता येथे
१७८४ साली ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’ची स्थापना झाली. ब्रिटिश ज्युरी आणि
संस्कृत पंडित विल्यम जॉन्स यांनी या संस्थेची स्थापना केली.ही संस्था
भारतीय संस्कृती आणि इतिहास यांच्या अभ्यासाचे केंद्र बनले. तिथूनच पुढे
पुरातन संशोधनाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.अलेक्झांडर कन्निंग्हम
यासारखे ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट आणि त्याचबरोबर काही भारतीय अभ्यासक यांचा
या संशोधनात महत्वाचा वाटा होता.हसमुख धीरजलाल सांकलिया हे संस्कृत विद्वान
आणि आर्किओलॉजिस्ट यांचे भारतातील पुरातत्त्व संशोधन कार्यात महत्वाचे
मोलाचे योगदान होते.त्यांनी प्रोटो आणि प्राचीन भारतातील कालखंडाबाबत
संशोधन केले होते.तसेच पुढील काळात पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये
आर्किओलॉजीचे रीतसर अभ्यासक्रम सुरु करण्यात अग्रेसर होते.
१८६१ साली ‘आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’ या सरकारी संस्थेची स्थापना
करण्यात आली. तेव्हापासून पुरातत्त्व संशोधन आणि अभ्यास यावर ही संस्था
आजतागायत काम करत आहे.
विविध ठिकाणी सुरू असलेल्या अभ्यासामध्ये भारताचा इतिहास अश्मयुगीन
काळापर्यंत मागे जातो याचा शोध लागला. त्या काळात वापरात असलेली दगडांची
हत्यारे अशाच एका उत्खननात ब्रिटिश आर्किओलॉजिस्ट रॉबर्ट ब्रूस फूट यांना
मद्रास जवळ पल्लवरम येथे १८६३ साली सापडली. त्यामुळे त्यांना “फादर ऑफ
इंडियन प्री-हिस्टरी” या विशेषणाने ओळखले जाते.
भारतीय इतिहास हा साधारण १.४ दशलक्ष वर्षे किंवा त्यापेक्षाही जुना आहे
याचे पुरावे एका संशोधनातून समोर आले. महाराष्ट्रातील बोरी येथे काही
अश्मयुगीन हत्यारे ज्वालामुखीच्या राखेच्या थरावर मिळाली होती. वैज्ञानिक
संशोधनातून या टेफ्राचा काळ शोधण्यात आला. तो काळ १.४ दशलक्ष
वर्षांपूर्वीचा असल्याने त्यात सापडलेल्या वस्तू अश्मयुगीन काळातील
असल्याचे सिद्ध झाले. अनेक ठिकाणी उत्खनन चालू होतेच. तसेच पहिली नागरी
संस्कृती म्हणून ओळखल्या जात असलेल्या सिंधू संस्कृतीवर शोध स्वातंत्र्य
पूर्व काळापासून शोध चालु होताच. स्वातंत्र्य मिळाल्यावर फाळणी नंतर सगळ्या
साइट्स सध्याच्या पाकिस्तानात गेल्या.त्यामुळे भारताने नव्याने सिंधू
संस्कृती शोध मोहिम सुरु केली आणि स्वतंत्र भारतातील सिंधू संस्कृतीवर
प्रकाश पडला.
कोणत्याही संस्कृतीबाबत जाणून घ्यायचे असेल तर तेथील प्रचलित भाषा व लिखित
माहिती समजुन घेणे सगळयात महत्वाचे ठरते. प्राचीन भारतात ब्राह्मी,
खारोश्ती ह्या लिपी कारभारासाठी वापरल्या जात होत्या. अशाच संशोधनात अनेक
शिलालेख मिळाले. तेव्हा ही लीपी सोडवण्याचे प्रयत्न सुरु झाले. ब्रिटिश
आर्किओलॉजिस्ट जेम्स प्रिन्सेप यांनी १८३७ साली पहिल्यांदा ही लीपी सोडवली
होतीच. त्यामुळे पुढील संशोधनास नवीन दिशा मिळाली आणि अनेक विद्वान लोकांनी
त्यांचे शोध पुढे आणून प्राच्य ज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात पुरातत्त्व संशोधनासाठी
ही महत्वाची कामगिरी बजावत आहे. आजपर्यत सिंधू संस्कृतीच्या अनेक साइट्स
सध्याच्या भारतात राजस्थान ,गुजरात,पंजाब,हरियाणा इत्यादी ठिकाणी मिळाल्या
आहेत.प्राचीन भारताविषयी अजूनही खूप संशोधन या संस्थेमार्फत वेगवेगळ्या
ठिकाणी सुरु आहे.आतापर्यंत झालेल्या अशाच संशोधनांविषयी आपण पुढील काही
भागात अधिक जाणून घेऊया.
संकलन -ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन- स्वाती भट
पुरातत्त्व म्हणजे काय??

आठवणींमध्ये रमायला कोणाला आवडत नाही ? किंवा आपल्या आधी घडलेल्या घटना ऐकताना आपण रमतोच! थोडक्यात काय तर आपल्या पूर्वीचा इतिहास हा नेहमीच माणसाच्या कुतूहलाचा भाग राहिला आहे.नदीचे मूळ आणि ऋषींचे कूळ शोधू नये असे म्हंटले जाते.परंतु हे शोधायचा प्रयत्नच नाही केला तर माणसाला सिंधू नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीचा शोध कसा लागला असता? सिंधू संस्कृतीतल्या माणसांविषयी कसे कळले असते? अगदी पृथ्वीचा उगम कसा झाला, इथपासून ते आता काही शतकांपूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या साम्राज्यांविषयी अनेक गोष्टींचा उलगडा होण्यामागे मूळ कारण होते ते माणसाचे कुतूहल. ह्या कुतूहलातूनच संशोधन सुरू झाले आणि पुरातत्व या शाखेचा उदय झाला. पुरातत्त्वाचा अर्थच पुरातन तत्त्व. अर्थात प्राचीन तत्त्व. मग हे तत्त्व काही केवळ मानवी प्रजातीचंच असेल असे नाही तर अगदी प्राणी, वनस्पती अशा सजीव घटकांपासून ते पूर्वीच्या काळी वापरली जाणारी भांडी ,नाणी,अशा अनेक निर्जीव गोष्टींचा यात समावेश होतो. राजे -राजवाडे, कला ,संस्कृती, साहित्य यांनी आपला पूर्वकाल समृद्ध आहे. या सगळ्यांचे संशोधन म्हणजे पुरातत्त्व संशोधन म्हणता येईल.
लिखित इतिहास आणि पुरातत्त्व संशोधन यामध्ये नक्की काय फरक याविषयी एक संभ्रम सर्वसामान्य जनांच्या मनात कायम असतो. आपण शाळेत किंवा अन्य पुस्तकात वाचतो तो इतिहास अशी आपली समजूत असते.परंतु खरं म्हणजे लिखित आणि पुरातत्व संशोधन हे दोन्ही एकमेकांना पूरक ठरतात.
काही बखरी,दस्तावेज,शिलालेख यांच्या संदर्भावरून पुरातत्व संशोधक अभ्यास करत असतात त्याचवेळी त्यांनी केलेले संशोधन लिखित स्वरूपात आपल्याला पुस्तकांनातुन वाचायला मिळते. तेच आपण इतिहास म्हणून वाचत असतो. पुरातत्त्व संशोधनात मानवी इतिहासापासून ते भाषा, संस्कृती, साहित्य, कला, विज्ञान, समाजशासत्र अशा अनेेक विषयांचा अभ्यास सामावलेला असताे. असे संशोधन करताना फार वेगवेगळे अनुभव येत असतात. एक अभ्यासक म्हणून या प्राचीन तत्त्वाचा अभ्यास करताना या वास्तूंविषयी,वस्तूंविषयी एक आगळा दृष्टिकोनच सापडतो.तोच मांडण्याचा प्रयत्न पुढच्या लेखमालेत असेल…क्रमशः
लेणी:महत्वाची ऐतिहासिक वास्तू
ऐतिहासिक वास्तू या पुरातत्त्व संशोधनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात. महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. एखाद्या गडावर गेल्यावर आजही मराठी मावळ्यांचा पराक्रम आठवून ऊर अभिमानाने भरून येतो. किल्ल्यांप्रमाणेच अजून एक महत्वाची वास्तू म्हणजे लेण्या.लेण्या त्या त्या काळातील सामाजिक,आर्थिक,राजकीय ,सांस्कृतिक स्थितीचे संदर्भ आपल्यापर्यत पोहचवतात. ‘लेणी’ म्हणजे डोंगर, टेकडी पर्वत, खडक कोरून तयार केलेली गुहा. संपूर्ण भारतात मिळून एकूण १२०० च्या आसपास लेण्या आहेत. त्यापैकी जवळपास ८०० लेण्या या फक्त महाराष्ट्रात आढळतात. याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रातील अग्निजन्य खहक हा अशा प्रकारच्या कोरीव कामासाठी अनुकूल होता. हा खडक मध्यम कठोर असून यावर कोरीव काम करणे सहज शक्य होते. घारापुरी, कान्हेरी, महाकाली अशा अनेक लेण्या महाराष्ट्रात आहेत. अजिंठा-वेरूळ लेणी बघण्यासाठी तर परदेशी पर्यटकसुद्धा गर्दी करतात.
या लेण्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या धार्मिक वास्तू आहेत. सर्वात जास्त गुहा बौद्ध धर्मियांसाठी केलेल्या आहेत. विविध धर्मांच्या आश्रयदात्यांनी त्या कोरण्यासाठी सढळ हातांनी दानधर्म केला. या लेण्या घडवण्यासाठी बौद्ध धर्माचे अनुयायी असलेल्या राजांकडून ही भरघोस मदत घेतली जायची. आतापर्यंतच्या संशोधनानुसार महाराष्ट्रात लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व पहिले -दुसरे शतका पर्यंत मागे नक्कीच खेचता येईल. भाजे, कार्ले, बेडसे या लेण्या या अगदी सुरवातीच्या काळात कोरण्यातआल्या असे संशोधकांचे मत आहे. सम्राट अशोकाने अंदाजे तिसऱ्या शतकात बिहार येथे बांधलेल्या लोमसऋषि लेणीचा महाराष्ट्रातील लेण्यांच्या घडणीत प्रभाव दिसून येतो.
हिनायन आणि महायन अशा दोन कालखंडात या लेण्यांचे प्रकार प्रामुख्याने विभागले जातात. बौद्ध धर्माच्या सुरुवातीच्या काळातील हीनयान पंथामध्ये बुद्धाचे मानवी रूप गृहित धरले होते. त्यामुळे त्यांना मूर्तिपूजा अमान्य होती. त्यांच्या कलाविष्कारामध्ये बुद्धाच्या प्रतीकांना महत्त्व होते. बुद्धाच्या जीवनातील चार प्रमुख घटना चार प्रतीकांच्या द्वारे दर्शविल्या जात. जन्माचे प्रतीक हत्ती (श्वेत गज), ज्ञानाचे प्रतीक पिंपळवृक्ष (बोधिवृक्ष), उपदेशाचे प्रतीक चक्र(धर्मचक्र), तर बुद्धाच्या निर्वाणाचे प्रतीक स्तूप, अशा रीतीने हीनयान पंथाची कला दिसून येते. हिनायन पंथ बुद्धांच्या मूळ शिकवणीचे पालन करतो. आत्म-शिस्त व ध्यान यांच्याद्वारे हे मोक्ष मिळवणे यावर भर देतात. महायान पंथाच्या उदयाबरोबर बौद्ध धर्मात मूर्तिपूजेला प्रारंभ झाला. त्यात बुद्धाला लोकोत्तर दैवी अंश मानून त्याच्या भक्तीला प्राधान्य देण्यात आले. त्यातून बुद्धाच्या विविध प्रतिमांची निर्मिती झाली. बुद्धाच्या मूर्ती निरनिराळ्या मुद्रा-प्रकारांत दिसून येतात. ध्यानस्थ मुद्रा, भूमीस्पर्श मुद्रा, अभय मुद्रा, वितर्क मुद्रा हे त्याचे काही प्रकार.
पूर्वीच्या काळी पावसाळ्यात आश्रय घेण्यासाठी बौद्ध भिक्खू तसेच व्यापारी वर्ग लेण्यांचा उपयोग करत असत. ‘वर्षावास’ म्हणून सुद्धा या लेण्या वापरल्या जात होत्या. या लेण्यांंमध्ये त्या काळात प्रचलित असलेल्या ब्राह्मी लिपीमध्ये, व प्राकृत आणि संस्कृत भाषांमध्ये शिलालेख आढळून येतात. ते मुख्यत: दानलेख या स्वरूपाचे आहेत.

या लेण्यांमध्ये विहार आणि चैत्यगृह हे दोन मुख्य प्रकार असतात. तसेच पाणपोई, मंडप या सारख्या सोयी असतात. विहार म्हणजेच जिथे राहण्याची व्यवस्था असते अशी जागा. हीनयान पंथाच्या उपासकांनी इसवी सन दुसऱ्या शतकात डोंगर खोदून विहार आणि चैत्य निर्माण करण्यास सुरुवात केली. या काळानंतरच भारतात पुण्याजवळ भाजे, कोंडाणे, कार्ले तसेच जुन्नर, बेडसे, अजिंठा, नाशिक अशा ठिकाणी चैत्यगृहे व विहारांची निर्मिती झाली.

विहार बांधताना त्यामध्ये मोठा दिवाणखाना, काही ठिकाणी शयनगृह तसेच आश्रितांसाठी निवासव्यवस्था या सुविधा असायच्या. चैत्यगृह हे सर्वांसाठी प्रार्थनागृह म्हणून बांधलेले असे.चैत्यगृहामध्ये स्तूप असतो. स्तूप म्हणजेच, महान व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी, जमिनीत पुरून त्यावर दगड व मातीचा ढिगारा रचला जायचा. मृताचे स्मारक म्हणून घुमटाच्या आकारचे शिल्प तयार केले जायचे. वेदिका, अंड, हर्मिका आणि छत्रावली अशा रचनेमध्ये हे स्तूप शक्यतो बांधले जात. काही ठिकाणी निर्वाणवीथी ( स्मशानगुफा सुद्धा) पहायला मिळतात. भाजे, कान्हेरी या काही नमूद करण्यासारख्या जागा. वेरुळ ( गुफा क्र.05) व कान्हेरी ( क्र. ११) या लेण्या शैक्षणिक केंद्र असल्याचे ही समजले जाते.

कालौघात या लेण्यांच्या रचनेत अनेक बदल झाले; या मधूनच मंदिरे यासंकल्पनेचा उदय झाला व मंदिरे अस्तित्वात आली.बुद्ध धर्माचा प्रभावअसलेल्या ‘ब्राह्मणीकल लेण्या’ ही बांधल्या गेल्या.त्याची सुरुवात साधारणइसवी सन पाचव्या शतकापासून झाली असावी असे संशोधन सांगते.त्याविषयी वाचूया पुढच्या भागात…
माहिती संकलन व सर्व छायाचित्रे: ऐश्वर्या देवस्थळी
शब्दांकन : स्वाती भट

सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं

फोटो स्रोत, Amit Samant
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कोकणवासियांनो आणि पर्यटकांनो, सिंधुदुर्गात मालवणला जाताना, घुमडे या गावाजवळ माळरानावर गोल आकारात रचलेले काही मोठ्या आकारातील दगड पाहिले आहेत का? जर पाहिले असतील, तर लक्षात घ्या ते साधेसुधे दगड नाहीत.
ती गोलाकार मांडलेली 'शिळावर्तुळं' आहेत. ही आहेत उत्तर अश्मयुगातील किंवा महापाषाणीय संस्कृतीतील नागरिकांनी मृत आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकं.
अशा स्वरुपाची स्मारकं महाराष्ट्रात अडीच हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात अश्मयुगाच्या अखेरीस नेमकी कोणती संस्कृती नांदत होती? हा नवा प्रश्न पुरातत्वज्ञांसमोर उभा राहिला आहे.
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिळावर्तुळं आढळली आहेत. या वर्तुळांचं आणि स्मृतीस्मारकांच्या नेमका काळ ठरवण्याचं (डेटींग) काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत केवळ पुणे, विदर्भ, कर्नाटक इथेच ही स्मारकं आढळली होती.
पुरातत्वज्ञांच्यामते अश्मयुगात अशा प्रकारची शिळास्मारकं उभारण्याची पद्धत रूढ होती. परंतु कोकणात अशी शिळावर्तुळं कधीच आढळली नव्हती.
याही पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर येथे पुरातत्वअभ्यासक व पत्रकार विनायक परब यांना सापडलेल्या दोन महापाषाण युगीन शिळास्मारकाच्या निमित्ताने कोकणाचा इतिहास अश्मयुगीन कालखंडापर्यंत मागे गेला होता, त्यात आता घुमडे गावाच्या शिळावर्तुळांची भर पडली आहे.
सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीच यांच्यामुळे प्रसिध्द असलेल्या मालवण शहरापासून 6 किलोमीटरवर घुमडे हे गाव आहे. गावातल्या निसर्गरम्य पठारावर 7 शिळावर्तुळं (Megalithic Circles) शोधून काढण्यात हौशी पुरातत्वअभ्यासक अमित सामंत आणि पुरातत्व अभ्यासक विनायक परब यांना यश आले आहे.
यापूर्वी महाराष्ट्रात विदर्भात अशा प्रकारची शिळावर्तुळं सापडलेली आहेत. पण, दक्षिण कोकणात प्रथमच अशा प्रकारची महापाषाणीय शिळावर्तुळं सापडली आहेत.

फोटो स्रोत, Amit Samant
शिळावर्तुळं म्हणजेच विशिष्ट आकाराचे दगड ठराविक अंतरात गोलाकार रचण्यात आलेले असतात. ही एकप्रकारची स्मृतिस्मारकं असतात. आपल्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ अशी स्मारकं रचण्याची परंपरा महापाषाणीय मानवी संस्कृती असल्याचं पुरातत्वज्ञांचं मत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या 'सेंटर फॉर एक्स्ट्रा म्युरल स्टडीज' आणि 'इन्स्ट्युसेन' (INSTUCEN) यांच्यावतीने विद्यापीठातील मराठी भाषा भवन इथे 'एक्सप्लोरेशन इन महाराष्ट्र - 5' ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील 23 व्यावसायिक आणि अव्यावसायिक पुरातत्ववेत्यांनी विविध विषयांवर आपले शोधनिबंध सादर केले.
जून महिन्याच्या अखेरीस पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याच्या पुरातत्व विभाग आणि संग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे हे उपस्थित होते. याच कार्यशाळेत घुमडे गावात आढळलेल्या महापाषाणीय शिलावर्तुळांविषयी शोधनिबंध सादर करण्यात आला.
शिळावर्तुळं म्हणजे काय?
सिंधुदुर्गातील घुमडे इथल्या शिळावर्तुळंचा शोध घेणारे विनायक परब यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली.
शिळावर्तुळं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर देताना परब सांगतात, "अश्मयुगीन काळात माणसांच्या मृत्यूनंतर त्यास दफन केलेल्या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी शिळास्मारकं उभारली जात असतं किंवा शिळावर्तुळं रचली जात असत. सिंधुदुर्गातील घुमडे गावात आम्हाला अशी 7 शिळावर्तुळं आढळली असून यातली 3 वर्तुळं चांगल्या अवस्थेत आहेत. तर, उरलेली 4 वर्तुळं अखंड नाहीत."

फोटो स्रोत, Amit Samant
परब पुढे असंही सांगतात की, "मात्र ती शिळावर्तुळंच आहेत याची कल्पना येण्याइतपत ती व्यवस्थित आहेत. इथे स्मशान होते का याचा शोध घेण्यासाठी या शिळावर्तुळांमध्ये उत्खनन करावे लागते, अनेकदा अवशेष सापडतातही. मात्र तळ कोकणात प्रतिवर्षी होणाऱ्या तुफान पावसाने इथला मातीचा वरचा मोठा थर पूर्णपणे वाहून गेला असून सध्या पाहायला मिळते ते जांभा दगडाचे पठार किंवा सडा. तळ कोकणातल्या तुफान पावसामुळे या भागात पुरातत्वीय बाबी तुलनेने कमी सापडतात."
'सेक्रेड ऑलवेज अ सेक्रेड'
शिळावर्तुळांबद्दल अधिक माहिती देताना परब सांगतात, "मात्र पेंडूरच्या बाबतीत बोलायचे तर अजस्त्र असे हे शिळाखंड किंवा घुमड्याच्या बाबतीत शिळावर्तुळ पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याचा प्रश्नच येत नाही. या शिळावर्तुळांच्या शोधाला अधिक बळकटी मिळण्यास महत्त्वाच्या ठरल्या, त्या इथेच सापडलेल्या काही मध्ययुगीन समाधी."
"ही शिळावर्तुळे आणि समाधी एकाच ठिकाणी आहेत. पुरातत्वामध्ये 'वन्स सेक्रेड ऑलवेज अ सेक्रेड' असं म्हटलं जातं. याचा अर्थ एखाद्या जागेचा विशेष किंवा त्याचं महत्त्व हे दीर्घकाळ मानवी पिढ्यांमध्ये सांस्कृतिक स्मृतीच्या माध्यमातून जपलं जातं," असं त्यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Vinayak Parab / Facebook
आधुनिक एपिजिनोमिक्स नावाची विज्ञानाची नवी शाखा असं सांगते की, ही सांस्कृतिक स्मृती आपल्या जनुकांमधून पुढील पिढीकडे संक्रमित होते. हीच जागा मध्ययुगामध्येही तत्कालीन पिढीने समाधीसाठी निवडण्यामागे हेच सांस्कृतिक स्मृतीचे गणित काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
परब पुढे सांगतात, "सिंधुदुर्गातील पेंडूर इथे सापडलेल्या महापाषाणयुगीन संस्कृतीचे निदर्शक असलेल्या शिळास्मारकानंतर, पाषाणयुगाचे पुरावे आजूबाजूला आणखी सापडायलाच हवेत, असं सातत्यानं वाटत होतं. तसं गृहितकही मांडलेलं होतं. आता अमित सामंत यांच्या गावी घुमडे येथे सापडलेल्या अश्मयुगीन शिळावर्तुळांमुळे त्या गृहितकाला बळकटीच आली आहे. त्यामुळे कोकणाच्या प्राचिनत्त्वावर अधिक प्रकाश पडेल."
शिळावर्तुळं किंवा महापाषाणीय दफनांचा (स्मशान) इतिहास
ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी त्यांच्या भारताची कुळकथा या पुस्तकांत शिळावर्तुळं आणि महापाषाणीय दफने यांच्याबद्दलचे स्पष्टीकरण दिलं आहे.

फोटो स्रोत, Amit Samant
ढवळीकर लिहीतात, "महाराष्ट्रात महापाषाणीय दफने विदर्भात शेकडो आहेत. पुण्याजवळही काही आढळली आहेत. त्यांचा शोध डेक्कन कॉलजचे डॉ. ह. धी. सांकलिया यांनी लावला. विदर्भातील महापाषाणीय संस्कृतीचा सखोल अभ्यास डॉ. शां. भा. देव यांनी केला. तिथे खूप विस्तृत महापाषाणीय स्मशाने आहेत. ही सगळी शिळावर्तुळंच आहेत. त्यांचा व्यास 10-30 मीटर इतका आहे. शिळावर्तुळांची मधली जागा मृताचे अवशेष पुरण्यासाठी वापरली असते. ती प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत आढळतात."
ढवळीकर पुढे लिहीतात, "महापाषाणीय दफनांमध्ये सहसा आढळणारी पद्धत अशी की, मृत व्यक्तीस किंवा तिच्या अस्थी व इतर वस्तू पुरण्यासाठी पुरेसा होईल एवढा खड्डा खणला जात असे. खड्ड्यात मृत शरीर किंवा अस्थिकुंभ व त्यासोबत खापराची भांडी ठेवण्यात येत. या भांड्यांमध्ये मृतात्म्यांसाठी अन्नपाणी ठेवत असावेत. याखेरीज कुऱ्हाडी, तलवारी, खंजीर, घोड्याचे अलंकार यासारख्या लोखंडी वस्तूही ठेवल्या जात. अशा रीतीने पूर्ण सामग्री भरली की खड्डा मातीने बुजवला जाईल. त्यावर दगडधोंडे, माती यांचा एक ढिगारा रचला जात असे आणि त्याच्याभोवती थडग्याच्या जागी निदर्शक म्हणून 'शिळावर्तुळ' उभं केलं जात असे."

फोटो स्रोत, Amit Samant
मग, सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेली शिळावर्तुळं ही देखील स्मशानेच आहेत काय? असा प्रश्न परब यांना विचारला असता ते सांगतात, "घुमडे गावात आढळलेली ही स्मारकं जांभा खडकाच्या पठारावर आहेत. इथे पाऊस जोरदार होतो. त्यामुळे इथल्या शिळावर्तुळांवर असलेली माती वाहून गेली असावी. सध्या दिसत असलेलं शिळावर्तुळांचं स्वरुप हे स्मारकांप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी या शिळावर्तुळांना स्मशानं संबोधता येणार नाही. पण म्हणून ती स्मशानं नाहीत असंही म्हणता येणार नाही."
स्मारकं की स्मशानं?
घुमडे गावातील या शिळावर्तुळांच्या कालखंडाबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसीने मुंबईस्थित ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांच्याशी बातचीत केली.
दलाल सांगतात, "भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये इ.स.पूर्व 1000 ते इ.स. 300 या कालखंडात उभारण्यात आलेली अशी शिळावर्तुळे आढळली आहेत. महाराष्ट्रात पुण्यात आणि विदर्भात इ.स.पूर्व 600-700 या कालखंडात उभारण्यात आलेली शिळावर्तुळं दिसतात. हा सगळा कालखंड अश्मयुगानंतरचा कालावधी आहे. या काळात मृतांना पुरण्यासाठी स्मशानं उभारली जात. त्यात माणसांना पुरण्यात येत असे आणि त्याभोवती शिळावर्तुळं उभारण्यात येई. सध्या कोकणात आढळलेली शिळावर्तुळं ही स्मशानं असण्याची शक्यता नाकारता येत नाही."
घुमडे गावात इतिहासाच्या पाऊलखुणा
सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेल्या या शिळावर्तुळांचा माग काढणारे हौशी पुरातत्व अभ्यासक अमित सामंत यांनी त्यांच्या शोधाबद्दल बीबीसीला माहिती दिली.

फोटो स्रोत, Amit Samant
सामंत सांगतात, "2014मध्ये गिरिमित्र संमेलनात विनायक परब यांनी सिंधुदुर्गातील पेंडूरच्या महापाषाणयुगीन शिळास्मारकाबद्दल सादरीकरण केलं होते. त्यावरून प्रेरणा घेत मी माझ्या घुमडे या गावातल्या माळरानावर (सड्यावर) प्राचीन दगडांचा माग काढला. 2015पासून ही शोधमोहीम सुरू आहे."
"अशी 7 शिळावर्तुळं मला आढळली असून त्यांच्याबरोबरीनं दोन मध्ययुगीन समाध्या या गावात सापडल्या आहेत. यावरून कोकणाचा इतिहास अश्मयुगीन किंवा महापाषाणीय संस्कृतीपर्यंत मागे जात असल्याचं दिसून येतं," असंही सामंत यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Amit Samant
सामंत पुढे सांगतात, "त्याचबरोबर या घुमडे गावातून जाणारा मध्ययुगीन बांधीव व्यापारी मार्गही सापडला आहे. त्या मार्गावरील माल उतरवण्यासाठी असलेला धक्का, टोल/संरक्षणासाठी असलेली गुहा, कातळात खोदलेली घोडेबाव (step well) इत्यादी व्यापारीमार्गाला बळकटी देणार्या गोष्टी सापडलेल्या आहेत. त्याकाळी समुद्रामार्गे येणारा माल कोळंब खाडी मार्गे घुमडे गावातील व्हाळात (ओहळात) बांधलेल्या धक्क्यापर्यंत येत असे. तेथून जनावरांच्या पाठीवर सामान लादून बांधीव घाटमार्गाने माल सड्यावर येत असे व तेथून पुढे जात असे. हा घाटमार्ग बांधण्यासाठी चिर्याचे दगड वापरलेले आहेत."
जनावरांना चढण्याचा त्रास होवू नये यासाठी घाटमार्ग बनवताना पायर्या बनवलेल्या नाहीत ही विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, अशीही माहिती सामंत यांनी दिली.
सांस्कृतिक स्मृतींचा वारसा
घुमडे गावात अश्मयुगीन ते मध्ययुगीन स्मारके आणि व्यापारी मार्ग आढळल्याने दोन कालखंडातील पुरातत्त्वीय अवशेष एकाच ठिकाणी आढळण्यामागचे गूढ काय? असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे.

फोटो स्रोत, Amit samant
या प्रश्नावर बोलताना परब सांगतात, "सांस्कृतिक स्मृतींचा वारसा मानवी संस्कृती वेळोवेळी जपत आल्याचं आजवरच्या इतिहासातून आढळून आलं आहे. अश्यमयुगीन स्मारके घुमडेमध्ये आढळली. त्याचबरोबर मध्ययुगातही नेमकी हीच जागा समाधींसाठी निवडण्यात आली आणि आज 21व्या शतकांत देखील यातील सर्वांत मोठे शिळावर्तुळ गवळदेव म्हणून पुजले जाते. यावरूनच ही सांस्कृतिक स्मृती आजतागायत सर्व पिढ्यांनी जपली आहे हे लक्षात येते."
अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गवळदेव पुजला जातो. तिथे छोटेखानी शिळावर्तुळ तयार करण्याची प्रथा आहे. मात्र, इथे असलेली शिळावर्तुळे आणि यातील दगडांचे मोठे आकार, समाधी असलेल्या ठिकाणांशी त्याचे असलेले नाते हे थेट अश्मयुगाशीच जोडलेले आहे हे पुरते स्पष्ट करणारे आहे. अशीही माहिती परब यांनी दिली.
https://www.bbc.com/marathi/india-45187961
पुरातत्त्वीय उत्खनने
...................
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटामुळे पुरातत्त्व व इतिहासकार यांच्या नेहमीच्या अभ्यासाचे, संशोधनाचे हे प्राचीन स्थळ सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय झाले आहे. चित्रपट करमणूकप्रधान आहे. चांगला की कसा हा विषय येथे गौण आहे. ‘जो बीत गया उसका सच तुम्हे बताना अनिवार्य है। नहीं तो आनेवाली पिढी कभी जान न पाएगी मोहेंजोदडो की अच्छाई और सच्चाई।’
अच्छाई माहीत नाही; परंतु ‘जो बीत गया उसका सच’ आणि ‘सच्चाई’ जाणण्याचे काम खऱ्या अर्थाने समाजातील जे लोक करतात त्यांना आपण पुरातत्त्वज्ञ (Archaeologist) म्हणून ओळखतो. सर्वसामान्य माणसांना पुरातत्त्वज्ञ, अशा प्रकारची प्राचीन स्थळे कशी शोधून काढतो? याबद्दल नेहमीच कुतूहल वाटत असते. प्राचीन स्थळे शोधून काढण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. पाण्याच्या मुबलक साठ्याच्या काठावर मानव वस्ती करून राहतो, हे सर्वमान्य आहे. त्यामुळे हा मुद्दा सर्वेक्षणात लक्षात घेतला जातो. नद्यांच्या काठी प्राचीन काळी एकामागून एक वसाहती होऊन गेल्यामुळे तेथे अवशेषांचे एक ‘टेकाड’ बनते. या टेकाडांना भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ‘दडो’ (मोहेंजोदडो, चन्दूदडो इ.), राजस्थानात ‘थोडी’ उत्तर भारतात ‘टिला’ (कंकाली टिला), गुजरातमध्ये ‘टिंबो’ (वहरवो टिंबो) आणि महाराष्ट्रात आपण ‘पांढरीची टेकाडे’ म्हणून ओळखतो. मानवाच्या शतकानुशतके झालेल्या वावरामुळे व घरातील चूल, शेकोटी वगैरेंच्या राखेमुळे मातीला पांढरट रंग आलेला दिसतो. म्हणून ती ‘पांढरीची टेकाडे.’
वर्षानुवर्षे ऊन-पावसाच्या माऱ्यामुळे गाडल्या गेलेल्या स्थळांचा काही भाग ढासळतो. त्यामुळे पुष्कळ वेळा आत असलेली खापरे, मणी, नाणी, हाडे वगैरे उजेडात येतात. त्या आधारे पुरातत्त्वज्ञ तेथे चाचणी उत्खनन करण्यास एखादा लहानसा; पण खोल खड्डा घेतो. त्यामुळे त्याला त्या प्राचीन ठिकाणचा मातीच्या स्तराच्या रंगावरून कालक्रम ठरवणे सोपे जाते. प्रत्यक्ष सर्वेक्षणापूर्वी प्राचीन वाड्.मय अभ्यासले. उदा. महाभारतातील उल्लेखिलेल्या स्थळांची यादी करून प्रा. बी. बी. लाल यांनी ती ठिकाणे आज कोठे आहेत हे शोधले. त्यामध्ये सोनपत (सुवर्णप्रस्थ), पानिपत (प्राणिप्रस्थ) इ. स्थळे होती. त्याप्रमाणेच दंतकथाही महत्त्वाचा दुवा ठरतात. उदा. संगमनेरजवळील जोर्वे या ठिकाणी पूर्वीची जरासंध नगरी होती, अशी दंतकथा आहे. त्यावरून हे ठिकाण प्राचीन असावे, असा कयास करण्यास वाव असतो. प्राचीन नगरीचे अवशेष बरेचदा अस्ताव्यस्त झालेले असतात. त्यामुळे स्थानिक लोक अशा ठिकाणाला ‘उलटनगरी’ असेही म्हणतात. याशिवाय प्राचीन लेखातील गावांची नावे, परकीयांच्या नोंदी, प्राचीन चित्रे-नकाशे अशांमधून पुरातत्त्वज्ञ संदर्भ घेऊन ठिकाणाचा शोध घेतो.
आधुनिक युगात हवाई सर्वेक्षण, उपग्रह चित्रणाद्वारे सर्वेक्षण करूनदेखील पुरातत्त्वज्ञ उत्खननासाठी ठिकाणाची प्राथमिक निवड करतो. काही ठिकाणांचे शोध अपघातानेच लागतात. आपण जाणतो, की मोहेंजोदडो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हडप्पाचा शोध असाच अचानक लाहोर-दिल्ली रेल्वे रुळ टाकण्याच्या दरम्यान लागला. १९२२ मध्ये तेथे उत्खनन झाले आणि हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. यालाच आपण सिंधू संस्कृती या नावानेही ओळखतो.
अगदी अलीकडच्या काळात राखीगढी (हरयाणा), वेजलका (गुजरात), शिकरपूर (गुजरात) इ. ठिकाणी हडप्पा संस्कृती संदर्भात उत्खनन होत आहे. या पूर्वीच्या मानवाच्या विकासाचा टप्पा म्हणजे अश्मयुगीन मानव. त्या दृष्टीने पुराश्मयुग, मध्याश्मयुग व नवाश्मयुग असे प्रागैतिहासाचे तीन कालखंड मानले जातात. त्यापैकी मध्याश्मयुगाचे अवशेष असलेले स्थळ वहरवो टिंबो येथे उत्खनन झाले आहे. फक्त अतिप्राचीन कालखंडाच्याच स्थळांचे उत्खनन होते असे नाही, तर ऐतिहासिक कालखंडातील गाडल्या गेलेल्या स्थळांचेदेखील उत्खनन होते. दक्षिण भारतातील किझदी हे स्थळ संगमसाहित्याच्या कालखंडातील आहे. तालपद हे ठिकाण ओरिसात असून, ऐतिहासिक कालखंडातीलच आहे. मध्य युगाच्या सांस्कृतिक अवशेषांच्या अभ्यासासाठी चांदोरे, महाराष्ट्र येथील अलीकडच्या काळातील उत्खनन महत्त्वाचे ठरेल.
कोणतेही उत्खनन करण्यापूर्वी भारतीय पुरातत्त्व विभागाची परवानगी व इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात येते. उत्खनन साधारणपणे हिवाळ्यात म्हणजेच भारतातील हवामानाचा विचार करून करतात. प्रांतानुरूप बदल केले जातात. नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत साधारणत: प्रत्यक्ष पुरातत्त्वीय अवशेषांच्या स्थळाचे उत्खनन होते. प्रमुख पुरातत्त्वज्ञ, सहाय्यक, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि इतरही अनेक लोक मदत करतात. शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्यासाठी उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाची गरज असते. उत्खनने साधारणपणे दोन हंगाम ते सहा-सात हंगाम असे चालते. जेव्हा उत्खनन करता येत नाही, त्या काळात मिळालेल्या अवशेषांचा तौलनिक अभ्यास, लॅबोरेटरीमध्ये अवशेषांचे विश्लेषण उत्खननाचा अहवाल सादर करणे, उत्खननात मिळालेल्या वस्तूंचे शास्त्रीय पद्धतीने आरेखन केले जाते; तसेच मिळालेल्या अवशेषांचे संशोधन केले जाते. अशा अनेक गोष्टी मधल्या काळात केल्या जातात. एखाद्या साखळीसारखी ही प्रक्रिया असते.
२०११-२०१२ मध्ये वहरवो टिंबो, रणोदगाव, जिल्हा पाटण, गुजरात येथे महत्त्वपूर्ण उत्खनन झाले. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, उत्तर गुजरात पुरातत्त्वीय प्रकल्प (NoGAP) यांच्या संयुक्त विद्यमाने हे उत्खनन झाले. हे स्थळ म्हणजे गुजरातमधील महत्त्वाच्या मध्याश्मयुगीन मानवी अवशेषांचे ठिकाण होय. तेथे उत्खननादरम्यान प्रामुख्याने दगडी लहान आकारातील शस्त्रास्त्रे आढळली आहेत. या संस्कृतीचा काळ अंदाजे इ. पू. ७००० वर्षे मानला जातो. लहान आकाराची धारदार दगडी पाती आढळली आहेत. काही दगडांवर रंगीत गिलावा आढळला आहे. तांबड्या-पिवळ्या रंगाच्या या दगडांना ‘पॅलेट स्टोन’ अशी संज्ञा आहे. या बरोबरच या उत्खननामध्ये हरणासारख्या प्राण्याच्या हाडांचे अवशेष मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. खापरेही भरपूर प्रमाणात मिळालेली आहेत आणि त्यात अभ्रकाचे घटक आढळले आहेत. या उत्खननाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे पूर्णत: मध्याश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आहेत. धातूच्या वापराचे कोणतेही अवशेष नाहीत. तसे असते, तर त्यास ताम्रपाषाणयुगीन म्हटले गेले असते. भटक्या अवस्थेतील मानवाने येथे काही काळ अन्नाच्या उपलब्धतेमुळे वस्ती केली, असे मानायला वाव आहे. पुढील संशोधन सुरू आहे.
२०१४-१५ मध्ये राखीगढी या हडप्पा संस्कृतीशी संबंधित प्राचीन नगराचे महत्त्वाकांक्षी उत्खनन केले गेले. मोहेंजोदडोपेक्षा या नगराचा विस्तार मोठा आहे; तसेच राखीगढीच्या सात टेकड्यांपैकी निवडक टेकड्यांचे उत्खनन केले गेले. या निवडीसाठी हवाई सर्वेक्षण व GPR सर्व्हे तंत्राचा वापर करण्यात आला होता. त्याप्रमाणे एकूण नगररचना लक्षात घेऊन पुरातत्त्वज्ञ डॉ. वसंत शिंदे व त्यांच्या टीमने सुनियोजित उत्खनन केले. डेक्कन कॉलेज पुणे, हरयाणा राज्य पुरातत्त्व विभाग व सोल राष्ट्रीय विद्यापीठ, दक्षिण कोरिया या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या उत्खननादरम्यान दोन टेकड्या नव्याने प्रकाशात आल्या. यापूर्वी १९६३ मध्ये पहिले, १९९७-२००० मध्ये अमरेंद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरे व २०१३-१४ पासून डॉ. वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन कॉलेजने उत्खनन केले. नव्या अवशेषांनुसार या संस्कृतीचा कालखंड इ. पू. ६००० वर्षे इतका मागे जातो, असा संशोधकांचा अंदाज आहे. धग्गर-हाक्रा नद्यांच्या भूप्रदेशात हे प्राचीन नगर वसले होते.
धग्गर-हाक्रा नद्यांच्या भूप्रदेशात वसलेले राखीगढ हे प्राचीन नगर सुनियोजित पद्धतीने वसलेले असून, इथे सांडपाण्याची उत्तम व्यवस्था होती. सात आयताकार धान्याची कोठारे सापडली असून, त्यांच्या भिंती चिखलाच्या विटांनी बांधलेल्या आहेत. जमीन चिखलाने सारवलेली आहे. त्यामध्ये गवत, चुन्याचे अवशेष जमिनीवर दिलेल्या गिलाव्यात आढळून आले. किटकांचा संपर्क होऊ नये म्हणून आणि गवत ओलेपणा, आर्द्रता शोषून घेण्यासाठी चुना वापरला असावा, असा पुरातत्त्वज्ञांचा अंदाज आहे. ही कोठारे आकाराने मोठी आहेत. त्यामुळे ती सार्वजनिक असावीत अथवा तत्कालीन श्रीमंतांची/उच्चभ्रूंची असावीत.
वस्तूंमध्ये प्रामुख्याने टेराकोट्टाच्या मूर्ती, ब्राँझच्या वस्तू, कंगवे, तांब्याचे मासे पकडण्याचे गळ, सुया व टेराकोट्टा सील्स सापडले. ब्राँझच्या भांड्यांवर सोने व चांदीचे नक्षीकाम आढळले आहे. धातूची भट्टी सापडली असून, तिथे ३०० सेमी मौल्यवान दगड सापडले आहेत. त्यांना पॉलिश केलेले नाहीत; परंतु या दगडांना पॉलिश करण्याची हत्यारेही सापडलेली आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेथे आढळलेली स्मशानभूमी. तेथे एकूण पंधरा मानवी सांगाडे दफन केलेले आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ रोजच्या वापरातील भांडी मिळाली. स्त्रियांच्या तीन सांगाड्यांच्या डाव्या हातात शंखांच्या बांगड्या आहेत. एका स्त्रीच्या सापळ्याजवळ सोन्याचा दागिना मिळाला. डोक्याजवळ काही सेमी मौल्यवान दगडही मिळाले. याशिवाय इथे लहान आकाराची चाके, लहानशी झाकणे, चेंडू, प्राण्याच्या आकाराची खेळणी आढळली आहेत. प्रमाणित वजने आढळली आहेत. पंधरा सापळ्यांपैकी एक लहान मुलाचा आहे. त्यांच्याजवळ असलेल्या भांड्यांमध्ये धान्याचे कण आढळून आले. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगाड्यांमधील DNA मिळविण्यात आलेले असून, परिक्षणासाठी सेंटर फॉर सेल्यूलर अँड मोलिक्युलर बायोलॉजी हैदराबाद, हावर्ड विद्यापीठ आणि सोल नॅशनल विद्यापीठ, साऊथ कोरिया यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. या DNA च्या परिक्षणांवरून अनेक नवे सिद्धांत प्रकाशत येऊ शकतील.
सिंधू संस्कृतीचे राखीगढी हे जसे प्रचंड मोठे नगर सापडले; तसेच तत्कालीन ग्राम्य संस्कृतीचे अवशेषदेखील आढळून आले आहेत. २०१६ मध्ये वेजलका या गावाजवळ महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पुरातत्त्व व प्राचीन इतिहास विभागाने संशोधन व उत्खनन केले. इ. पू. ४,३०० या कालखंडातील ग्राम्य संस्कृती दाखवणारे हे पुरातत्त्वीय स्थळ होय. मानवी वस्ती आणि लहान प्रमाणात औद्योगिक वसाहत वेजलका गावात होती. सौराष्ट्रातील रणकपूर तालुका जिल्हा बोटड येथील हे उत्खनीत स्थळ होय. प्रो. एस. प्रतापचंद्र व प्रा. के. कृष्ण या प्रमुख पुरातत्त्वज्ञांनी हा प्रकल्प हाती घेतला होता. ग्रामीण अर्थकारण हा नागरी अर्थकारणाचा पाया मानला जातो. हा सिद्धांत लक्षात घेऊन वेजलका या साइटचे उत्खनन करण्यात आले. या उत्खननाच्या दरम्यान विविध स्तरांमध्ये जॅस्पर, अॅगेट, चाल्सीडोनी इ. दगडी लहान आकाराची क्षुद्रास्त्रे मिळाली. गांधीनगरच्या भूकंप संशोधन केंद्राच्या OSL पद्धतीने कालमापन केले असता हा कालखंड अंदाजे ७००० इ. पू. मागे जातो असे मानले जाते. खापराच्या तुकड्यांमध्ये अभ्रकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून आले. एकट्या सौराष्ट्रातच हडप्पा संस्कृतीच्या १९०पेक्षा जास्त साइटस् आढळून आल्या आहेत. संस्कृतीचा विकास व अर्थकारण या दोन्हींचा अभ्यास वेजलका सारख्या पुरातत्त्वीय उत्खनन स्थळांच्या स्तरशास्त्रावरून करता येतो.
येत्या चार-पाच वर्षांमध्येच सिंधू संस्कृतीच्या उत्खनन संशोधनास शतक पूर्ण होत आहे. आपल्या आजूबाजूला कोणत्या स्वरूपाचे पुरातत्त्वीय संशोधन सुरू असते याचे भान असले, की आपला सांस्कृतिक दृष्टिकोन व्यापक व विस्तृत होत जातो. गुजरातमधील शिकरपूर येथे २०१२-१३ मध्ये उत्खनन करण्यात आले. त्यामध्ये हडप्पा संस्कृतीमधील स्टिएटाइट माध्यमातील मुद्रा आढळून आली आहे. या मुद्रेवर सिंधुलिपी व गेंड्याचे अंकन आहे. GPR सर्व्हे तज्ज्ञांचा वापर करून प्रत्यक्ष उत्खननात ५ मीटर बाय ५ मीटरचे पाच खड्डे घेण्यात आले. शिकरपूर स्थळाच्या वस्तीच्या परिघावर तटासारखी जाड भिंत दहा मीटर जाडीची आढळली आहे. कच्छ प्रांतातील मध्यम आकाराच्या या साइटचे उत्खनन गुजरात विद्यापीठ, राज्य पुरातत्त्व विभाग व व्हिस्कॉन्सिन विद्यापीठातर्फे करण्यात आले.
पुरातत्त्व विभागातर्फे दक्षिण भारतात वैगई नदीच्या दोनही तीरांवर मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण २०१२-१३ मध्ये करण्यात आले. या वर्षभर संगमसंहितामध्ये आढळणाऱ्या वस्तीस्थानांचा शोध झालेल्या सर्वेक्षणात घेण्यात आला. अंदाजे २९३ स्थळांची नोंद घेण्यात आली व त्यापैकी ‘कीझडी’ या ठिकाणी २०१३-१४ मध्ये उत्खनन करण्यात आले. तेव्हा दोन वसाहती आढळून आल्या. समाजातील स्तरवारी त्यामध्ये दिसून येते. तेथे दागिने, चांगल्या अवस्थेतील बांधकामे आढळून आली आहेत. रोमशी या प्रदेशाचे व्यापारी संबंध असल्याचा पुरावाही आढळून आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही खापरांच्या तुकड्यांवर संगम तमिळ काळातील (इ. स. पूर्व ३ रे शतक) तमिळ-ब्राह्मी लिपीतील लेख आढळले आहेत. त्यापैकी काहींवर भिसन, अधन, अधिरन अशी नावे आहेत. कीझडीचे उत्खनन के. अमरेंन्द्रनाथ कृष्णन व डॉ. व्ही. वदचलम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
प्राचीन भारतातील इतिहास काळातील ‘तालपद’ या स्थळाचे उत्खनन प्रा. आर. के. मोहंती, डॉ. पी. पी. जोगळेकर यांनी २०१३-१४ व २०१४-१५ अशा दोन भागात केले. ओरिसा राज्यातील या पुरातत्त्वीय स्थानाचे वैशिष्ट म्हणजे शिशुपालगड या प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळाप्रमाणेच या नगराची रचना आढळून आली आहे. फक्त ते आकाराने लहान आहे. चौरसाकारात वस्ती असलेले हे ठिकाण मालगुनी नदीच्या उजव्या तीरावर आहे.
चांदोरे हे कोकणातील ऐतिहासिक स्थळ मुंबई विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर एक्स्ट्रा मोरल स्टडीज’ व ‘इंडियन स्टडी सेंटर’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २०१२ ते २०१५ अशा काळात उत्खनन कार्य चांदोरेला झाले. पुरातत्त्वशास्त्र हे फक्त प्रागैतिहासिक, हडप्पा संस्कृतीसारख्या इतिहासपूर्व काळापुरतेच मर्यादित नसते, तर मध्ययुगीन काळामधील मानवी संस्कृतीच्या अभ्यासासाठीही त्याचा उपयोग होत असतो, हे पुन्हा एकदा अलीकडच्या काळात लक्षात आणून देण्याचे कामही चांदोरे निमित्ताने डॉ. कुरुष दलाल यांनी केले आहे, असे मानले जाते. चांदोरे या स्थळाचा काळ हा इ. स. चे ८ वे शतक इतका मागे जातो. शिलाहार राजवटीच्या काळी तेथे व्यापार चालत असे. देशांतर्गत व्यापार कसा होता, त्यावरही त्यामुळे प्रकाश पडला आहे. हरगौरीची मूर्ती तेथे आढळून आली आहे. तेथे क्षुद्रास्त्र शस्त्रे सापडली आहेत. त्यावरून काळ आणखी मागे जाऊ शकतो. स्थानिक लोककथा पुरातत्त्वात नेहमीच महत्त्वाचा दुवा होतात. चांदोरेच्या या परिसराला स्थानिक लोक ‘कलावंतिणीचे घरटे’ म्हणून संबोधतात. स्थानिक लोक परंपरेप्रमाणे याचा अर्थ ‘सर्व आवश्यक सोयी व्यापारीवर्गाला उपलब्ध करून देणारे मध्यवर्ती ठिकाण’ असा होतो. ११ व्या शतकातील एक नाणे, काचेचे मणी, काचेच्या बांगड्या, १४ व्या शतकातील एकाच रंगात रंगवलेली भांडी अशा प्रकारचे इतर ऐतिहासिक पुरावेदेखील आढळून आले आहेत. पुढील अभ्यास येथे सुरू आहे.
पुरातत्त्व विभाग, विविध विद्यापीठे, स्वायत्त संस्था, परदेशी विद्यापीठे एकत्र येऊन पुरातत्त्वीय उत्खनने चालत असतात. अनेक क्षेत्रातील तज्ज्ञांचे योगदान या शाखेला असल्यामुळे पुरातत्त्व संशोधन व उत्खनन ही शाखा खऱ्या अर्थाने ‘मल्टी डीसिप्लिनरी स्टडीज’ म्हणतात अशी आहे. उत्खनन व त्यावरील संशोधन, अहवाल या बरोबरच त्याचे जतन हे मात्र भारतासारख्या देशात पुरातत्त्वज्ञांना मोठे आव्हान होऊन बसते. हे स्वरूप मात्र जगभर वेगळे आहे.
डॉ. शां. भा. देव
पब्लिकेशन डिव्हिजन, दिल्ली
अडीच रुपयेअलिकडे नुकतीच मुळामुठेवर अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. त्यापूर्वीच गोदावरीकाठी व प्रवरेकाठी ती सापडली होती. या दोन नद्यांच्या आसमंतांतच महाराष्ट्राचा आदिमानव सापडण्याची आशा डॉ. देव यांनी व्यक्त केली आहे.
1961 हे साल पुराणवस्तु संशोधन- खात्याच्या संवत्सराचे वर्ष होते. त्यानिमित्त व्याख्यानमालेच्या संचालकांनी पुरातत्वशास्त्रावर व्याख्यानमाला गुंफण्यात व त्या विषयात दर्दी व मातबर असलेल्या डॉ. शां. भा. देव यांची नियुक्ति करण्यात औचित्य दाखविले आहे.
‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे जरी कवींनी म्हटले असले तरी ऐतिहासिक वास्तु व स्फूर्तिस्थाने यांची जपणूक करणे हे राष्ट्राच्या सांस्कृतिक उत्कर्षाचे एक प्रमुख अंग असते. सांस्कृतिक संघर्षामुळे अथवा जलप्रलयसदृश नैसर्गिक आपत्तींमुळे लोकजीवन उद्वस्त झाल्याचे आपण वाचतो. परंतु भूमाता त्याच्या खुणा साक्षेपाने आपल्या पोटात जपून ठेवते याची आपल्याला तेवढीशी जाणीवहि नसते. तिचे मनोगत जाणण्याचे लाघव उत्खननशास्त्राला आहे.
डॉ. देव यांनी आपल्या पहिल्या व्याख्यानात पुराणवस्तु संशोधनाचा उद्भव कसा झाला आणि इंग्रजी अधिकाऱ्यांच्या जिज्ञासेतून या शास्त्राची प्रगति कशी झाली हे सांगितले आहे. भारतातील प्राचीन अवशेषांचा अभ्यास करण्यासाठी 1784 साली सर विल्यम जोन्स यांनी कलकत्त्याला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. मुंबई व मद्रास येथेहि अशाच तऱ्हेच्या संस्था स्थापन करण्यात आल्या. जेम्स प्रिन्सेप यांनी ब्राह्मी व खरोष्ठी लिप्या वाचल्या म्हणून मौर्य सम्राट अशोक यांच्या शिलालेखांचे वाचन करणे शक्य झाले.
कनिंगहॅमच्या कारकिर्दीत उत्तर भारतातील बौद्ध अवशेषांचाच विशेषेकरून अभ्यास झाला. मौर्यकालीन दगडांचे अखंड स्तंभ, बौद्ध स्तूप, तक्षशिला, कोशांबी, श्रावस्ती या प्राचीन नगरांचा शोध कनिंगहॅम यांच्याच कारकिर्दीत लागला. गुप्त सम्राटांचे शिलालेख प्रकाशात आले. कॅनिंगहॅमनंतर सर जॉन मार्शल यांनी सिंधुसंस्कृतीचे दालन जगाला उघडून दाखवून मोठी क्रांति केली. या संस्कृतीचा शोध मार्शल यांनी उत्खननतंत्राचा अवलंब करून लावला. उत्खननशास्त्राला मान्यता प्राप्त करून देण्याचे श्रेय सर मॉर्टिमर व्हीलर यांनाच आहे. या तंत्रशुद्ध शास्त्राचा अवलंब करून भारतात विविध ठिकाण उत्खनने झाली. डॉ. देव यांनी भारतातील अश्मयुगापासून रोमन संपर्काच्या काळापर्यंतचा आढावा पहिल्या व्याख्यानात घेतला आहे.
या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रात नेवासे, नासिक, कोल्हापूर दायमाबाद, प्रकाशे, जोर्वे इत्यादि ठिकाणी झालेल्या उत्खननातून सापडलेल्या अवशेषांवरून अश्मयुगापासून तो तहत मुसलमानी काळापर्यंत लोकजीवन कसे होते याचे मूर्तिमंत चित्र दुसऱ्या व्याख्यानात उभे केले आहे. अश्मयुगातील मानवी जीवनाचा अभ्यास करण्यास तत्कालीन दगडी हत्यारे हे एकमेव साधन उपलब्ध असते. परंतु ताम्रपाषाणयुगानंतर माणसाने बनविलेली घरेदारे, भांडीकुंडी, अलंकार, दफन पद्धति, धान्य या गोष्टी उपलब्ध होतात. या सर्वांतून त्या त्या काळाचे सांस्कृतिक चित्र कसे निर्माण होते हे व्याख्यात्यांनी मोठ्या मनोरंजकतेने सांगितले आहे.
साध्या खापराच्या तुकड्यांतून मानवी कर्तृत्त्वाचा कसा साक्षात्कार होतो हे बघण्यासारखे आहे. कुंभार मातीची भांडी करताना धान्याचा भुसा मिसळतो. या जळालेल्या अवशेषांवरून तत्कालीन धान्याचा मागोवा लागतो. खापरावरील चित्रविचित्र नक्षीवरून तत्कालीन समाजाची कलाविषयक माहिती लागते. दायमाबाद येथे सांपडलेल्या माठावर महाराष्ट्राच्या प्राथमिक चित्रकलेचा पुरावा सापडतो. त्या माठावर एक मानवी आकृति आहे. ती आपल्याकडे मोर व हरणे आकृष्ट करीत असल्याचा व वाघासारखे प्राणी दूर जात असल्याचा देखावा आहे.
खापराप्रमाणे तत्कालीन वास्तू, उत्खनित सांगाडे, नाणी, अलंकार व असे अनेकविध पुरावे सांस्कृतिक मूल्यमापन करताना उपयोगी पडतात. उत्खनित वास्तूवरून नगररचना, वास्तूबद्दलचे संकेत यावर चांगला प्रकाश पडतो. उत्खनित सांगाड्यावरून वांशिक साधर्म्याचा आणि मानवी स्थलांतराचा अंदाज मानववंश शास्त्रज्ञाला घेता येतो. फुलपाखरू, कासव, बेडूक, मगर यांच्या आकृतीचे मणी उत्खननात सापडले आहेत. असे अनेक पुरावे डॉ. देव यांनी या व्याख्यानात स्पष्ट केल्यामुळे प्राचीन काळात लोकजीवन कसे होते ते चांगले समजते.
अलिकडे नुकतीच मुळामुठेवर अश्मयुगीन हत्यारे सापडली आहेत. त्यापूर्वीच गोदावरीकाठी व प्रवरेकाठी ती सापडली होती. या दोन नद्यांच्या आसमंतांतच महाराष्ट्राचा आदिमानव सापडण्याची आशा डॉ. देव यांनी व्यक्त केली आहे. ताम्रयुगीन संस्कृतीच्या लोकांची स्थलांतरे, त्यांचा उगम, आर्यांशी संबंध या सर्वांचे मूल्यमापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनने करणे कसे आवश्यक आहे हि व्याख्यात्यांनी सांगितले आहे.
उत्खननशास्त्र हा क्लिष्ट विषय आहे असा लोकांचा ग्रह आहे. या शास्त्रासंबंधी सोप्या व सुंदर भाषेत लिहिलेला हा पहिलाच मराठी ग्रंथ आहे. प्रस्तुत ग्रंथांतील विवेचनावरून पुराणवस्तु संशोधकांपुढे कोणत्या समस्या उभ्या असतात याची चांगली कल्पना येते.
अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात आढळले अश्मयुगीन चित्रगुहेतील 'सप्तपदी कमळ’
अमरावती : येथील प्राचीन अंबादेवी मंदिर परिसरातील एका चित्रावरून एक अत्यंत वेधक शाेध लागला आहे. या चित्रगुहेच्या दगडी भिंतीवरील चित्रात एक सात पाकळ्यांचे कमळ स्वतंत्रपणे कोरले गेले आहे. विशेष म्हणजे यातील प्रत्येक पाकळी योनीच्या स्वरूपात आहे. ज्यामध्ये चार पाकळ्या वरच्या दिशेने आणि तीन पाकळ्या खालच्या दिशेने दिसत आहेत. या अश्मयुगीन चित्रगुहेत 'सप्तपदी कमळा'चा शोध असल्याची माहिती संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी दिली आहे.
डॉ. विजय इंगोले यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या सहा निसर्ग संशोधकांनी मोर्शीपासून अवघ्या ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सातपुडा पर्वतरांगेत २००७ साली जवळपास ३५ हजार वर्षापूर्वीच्या अश्मयुगीन चित्रगुहांचा सर्वप्रथम शोध लावला होता. ही बाब सर्वश्रुत आहे. या चित्रांचे अद्यापही या चमूव्दारे संशोधन आणि अभ्यास सुरू आहे.
योनीस्वरूप पाकळ्यांनी कोरलेल्या कमळाचा हा शोध अनेक गहन प्रश्न निर्माण करतो. याचे कारण म्हणजे योनी प्रजनन दर्शवते. यात ठळकपणे सात पाकळ्यांचे कमळ आहे, ज्याला सप्तपदी कमळ किंवा सात पायऱ्यांचे कमळ म्हणून ओळखले जाते. ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. प्रत्येक पाकळीचा मूळ आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरा चक्र, अनाहत चक्र, विशुध्द चक्र, अजना चक्र म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, विवेक आणि समाधी आहे. कमळ हे पावित्र्य, देवत्व, आत्मज्ञान आणि सृष्टीच्या शाश्वत चक्राचे प्रतिनिधित्व करणारे एक आदरयुक्त प्रतीक आहे.
हिंदू पौराणिक कथा, विधी आणि प्रतिमा शास्त्रातील त्याची उपस्थिती हिंदू संस्कृतीच्या धार्माक आणि आध्यात्मिक सारामध्ये त्याची अविभाज्य भूमिका अधोरेखित करते. त्याचे अंदाजे वय संभाव्यतः ४००० इस. पूर्व वैदिक काळाशी जोडलेले असावे. उल्लेखनीय शैला, स्त्रीत्व आणि निर्मितीच्या प्रतीकांसह त्याचा संबंध ती एक महत्त्वपूर्ण पुरातत्त्व कलाकृती म्हणून स्थापित करते. या गूढ शोधाच्या सभोवतालचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्यासाठी विस्तृत तपासणी आणि विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरेल. पुरातत्त्व भाषाशास्त्र आणि सांस्कृतिक अभ्यासातील तज्ज्ञ या अनोख्या प्रतिनिधित्वामागील अर्थ आणि महत्त्व उलगडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील. संशोधक डॉ. विजय इंगोले यावर एक संशोधन पेपरही तयार करीत आहेत. निसर्ग संशोधकांच्या चमूतील इतर वन्यजीव सदस्यांचे या संशोधनात महत्वपूर्ण योगदान आहे.
शांतिलाल पुरवार यांचा आगळा संग्रह
औरंगाबादचा पुरवार कुटुंबियांचा वंशपरंपरागत वाडा हा घर कमी आणि संग्रहालय जास्त भासतो. दहा पिढ्या नांदलेल्या त्या घरामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा आणि त्याहूनही मोठ्या पातळीवर सतरा हजार वस्तूंचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यात आला आहे. त्या वारशाचा संबंध काही दशकां-शतकांपूर्वीच्या वस्तूंसोबत आहेच, पण काही संदर्भ थेट हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवापर्यंतदेखील जाऊन भिडतात- औरंगजेबाने लिहिलेल्या ‘कुराण-ए-शरीफ’पासून अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेल्या दिव्यापर्यंत… ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ गावागावांत दडलेला असा सांस्कृतिक वारसा नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.
औरंगाबाद येथील छंदवेडे व ध्येयवेडे डॉ. शांतिलाल पुरवार यांनी दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहासाठी आयुष्य वेचले. त्यांनी स्वखर्चाने एकेक ऐतिहासिक वस्तूचा संग्रह केला. त्यांचे देहावसान काही वर्षांपूर्वी झाले, परंतु त्यांचे चिरंजीव श्रीप्रकाश पुरवार आणि त्यांचे दोन भाऊ हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वडिलांचा वारसा समर्पित भावनेने जपत आहेत.
शांतिलाल पुरवार यांच्या संग्रहात सतरा हजार पुराणवस्तू आहेत. त्यांनी त्या संग्रहाला ‘मातोश्री कौशल्या पुरवार म्युझियम’ असे नाव दिले आहे. त्यांचा तो संग्रह पुरवार कुटुंबियांच्या वंशपरंपरागत वाड्यात जपून ठेवलेला आहे. संग्रहालयात अश्मयुग ते ब्रिटिश कालावधीपर्यंतच्या दुर्मीळ वस्तू आहेत. तो संग्रह अनमोल तर आहेच, परंतु त्यातील काही वस्तूंचा ठेवा हा अतिप्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण व विविधता जपणारा आहे. संग्रहात सोळा दालने विषयवार आहेत.
पहिले
दालन हे धर्म व ईश्वर त्याचप्रमाणे देवदेवता यांवर आहे. त्यात सर्व
धर्मांचे तत्त्वज्ञान, ईश्वराची संकल्पना- त्यावर आधारित दुर्मीळ
पुराणवस्तू व ग्रंथ आहेत. त्यामध्ये औरंगजेबाने स्वत:च्या हाताने लिहिलेले
‘कुराण -ए-शरीफ’ आहे. शिवाय, हस्तलिखित गुरूचरित्र व इतर धार्मिक ग्रंथ
आहेत.
दुसरे दालन हे पाषाणयुगी वस्तूंचे आहे. त्यात औरंगाबाद परिसरातील पुराणमानव वापरत असलेली दगडाची (जॅस्पर) हत्यारे, मातीचे (टेरा कोटा) दिवे टेरा कोटा हे सातवाहनकालीन पेण्टल तेथे पाहण्यास मिळते. अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेला दिवाही तेथे आहे.
तिसरे दालन आहे निसर्गाचे! त्यात प्रामुख्याने संस्कृतीच्या उदयाचे अवशेष-जीवाश्म वनस्पती फॉसिल स्वरूपात मांडल्या आहेत. त्यात हडप्पापूर्व व हडप्पानंतरच्या कालखंडाची माहिती मिळते. त्यात भारतीय संस्कृतीचा उदय, प्रगती, राज्य संकल्पना, संस्कृतिविकास दाखवला आहे. सातवाहन, गुप्त, कुशाण, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटींची माहिती मिळते व तत्कालीन वस्तूही पाहण्यास मिळतात. चौथे दालन शिल्पांचे असून त्यात मृण्मूर्ती, पाषाणशिल्पे, धातू-ब्राँझ-काष्ठशिल्पे आहेत. त्यात स्फटिक, रतन, चांदी, तांबे यांच्याही मूर्ती आहेत. त्या दालनात तेवीसशे वर्षांपूर्वीची यक्षिणीची ब्राँझची मूर्ती आहे. फक्त बेल्जियमच्या ब्रुसेल्स संग्रहालयात आढळणारी, हयग्रीवाची मूर्तीही तेथे आहे. तसेच, नालंदा विद्यापीठात तयार झालेली टेराकोटाची बुद्धमूर्ती, यादवकालीन मूर्ती, सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळातील नागदेवतेची मूर्ती, स्फटिकाचा नृसिंह, सायफनचा (जलवहनाचे तंत्र) हत्ती आदी तर आहेच; त्याचबरोबर, जहर मोहरा (द्रव्य पदार्थात विष असेल तर जहर मोहरा ताबडतोब रंग बदलतो) आदी वस्तू आहेत. पाचवे दालन चित्रांचे असून, त्यात कागद, हस्तिदंत, काच यांवरील मुघल व राजपूत शैलीतील चित्रे आहेत. तसेच, अजिंठा लेण्यांतील चित्रांच्या प्रतिकृती, नक्कल, लघुचित्रेही आहेत. सहावे दालन हस्तलिखित पोथ्यांचे आहे. सात विविध धर्म व भाषांतील सचित्र पोथ्या, ग्रंथ आदी तेथे आहेत. त्यात प्राकृत, फारशी, अरबी, उर्दू ग्रंथ आहेत.
सातव्या शस्त्रास्त्रे दालनात आदिमानवी काळापासूनची शस्त्रे आहेत. त्यांतून आदिमानवाचा विकास कळून येतो.
दांडपट्ट्यासहित सोळा प्रकारच्या तलवारी त्या ठिकाणी आहेत. ग्रीक-अरबांच्या इसवी सनापूर्वीच्या शुद्ध पोलादाच्या भारी तलवारी त्यात आहेत. हलक्या आणि वजनदार धातूंची शस्त्रे तेथे पाहण्यास मिळतात. आठवे दालन – नाणी, मुद्रा, शौर्यपदके यांनी भरलेले आहे. इसवी सनपूर्व सहाशे वर्षांपासून आजपर्यंतची नाणी तेथे दिसतात. नववे दालन काष्ठशिल्प व काष्ठ कामाचे असून, त्यात जुन्या शैलीनुसार वास्तुशिल्पातील लाकडी खांब, कोपरे, कमानी, लाकडी मूर्ती अशी कलाशिल्पे आहेत. दहावे दालन विविध प्रकारच्या मण्यांचे आहे. तेथे इसवी सनपूर्व तीनशेपासून ते विविध कालखंडातील आभूषणांत वापरले गेलेले मणी आहेत. अकरावे दालन वस्त्र-प्रावरणांचे आहे. त्यामध्ये मराठे, राजपूत, मोघल यांच्या काळातील पोषाखांपासून ते पेशवाईपर्यंतची वस्त्रे आहेत. त्यात मुख्य आकर्षण अर्थातच सातवाहन काळातील पैठण ते रोम, ग्रीस, इजिप्तपर्यंत गेलेली पैठणी हे आहेच. त्यावर सुवर्णकाम आहे. बारावे दालन महिलावर्गाचे आकर्षण ठरावे असे आहे. त्यामध्ये रत्नांचा, आभूषणांचा संग्रह आहे.
आदिवासींच्या वस्तूंचा संग्रह तेराव्या दालनात आहे. चौदावे सौंदर्य कलादालन असून त्यात विविध काळातील दिवे, गृहोपयोगी वस्तू आहेत. काचेच्या वस्तू, गंजिफा, दौती ही आकर्षणे ठरतात. पंधरावे संगीत दालन आहे. त्यात वेगवेगळ्या वाद्यांचा संग्रह आहे. सोळावे आयुर्वेद दालन असून, त्यात प्राचीन काळापासून वापरात असलेला वनस्पती; तसेच, त्या संबंधीचे प्राचीन ग्रंथ यांचा संग्रह आहे. त्याशिवाय युवादालन, आशिया दालनात परदेशातील वस्तूंचा संग्रह आहे. परदेशातील नाणी व चलन यांचाही संग्रह आहे. बिद्री कलावस्तूंचेही वेगळे दालन आहे.
संग्रहाचे निर्माते शांतिलाल पुरवार हे पेशाने डॉक्टर होते. ते हौसेने शिल्पकला करत. मात्र त्यांना डोळ्यांचा आजार होण्याचे निमित्त झाले आणि त्यांच्या छंदाला वेगळे वळण मिळाले. शांतिलाल यांना भारतीय संस्कृतीच्या कलात्मक वारशाचा शोध घ्यावासा वाटू लागला. त्या इच्छेपायी त्यांनी औरंगाबाद जिल्हा, मराठवाडा आणि इतर परिसरात भटकंती सुरू केली व पुराण वस्तूंचा खजिना जमा केला. त्यांनी प्रसंगी वस्तू विकत घेतल्या. त्यांचा शोध जिज्ञासेतून शिल्पकला-चित्रकला यांच्या पलिकडे जाऊन विविध गोष्टींपर्यंत पोचला.
पुण्यातील
केळकर संग्रहालयाचे कर्ते दिनकर केळकर हे शांतिलाल यांचे समकालिन. शासनाने
केळकर संग्रहालयाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा केळकर यांच्याकडे तीनशे
वस्तू होत्या, तर त्याचवेळेस शांतिलाल यांच्याकडे सहाशे वस्तूंचा संग्रह
होता. शांतिलाल पुरवार आणि केळकर यांचा चांगला परिचय होता. केळकर यांच्या
संग्रहालयाच्या उभारणीमध्ये शांतिलाल यांचे सहकार्य होते. शांतिलाल यांनी
केळकर यांना औरंगाबादवरून अडीच ट्रक भरून लाकूड पुरवले होते. औरंगाबादला
निजामाचे दिवाण राजाकिसन प्रसाद यांचा वाडा होता. त्याचा मोठा लाकडी दरवाजा
शांतिलाल यांनी केळकरांना दिला असल्याची आठवण श्रीप्रकाश सांगतात. तो
दरवाजा केळकर संग्रहालयात पाहता येतो. श्रीप्रकाश ती माहिती देताना थोडे
बिचकतात. ते म्हणतात, या घटनांची कसलीही नोंद कागदोपत्री नाही.
औरंगाबादला महापालिकेचे शिवाजी संग्रहालय 1997 च्या आसपास उभे राहिले, मात्र त्यात ठेवण्यासाठी वस्तूच नव्हत्या. शांतिलाल पुरवार यांनी स्वत:हून त्या संग्रहालयाला आकार देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्यांच्याकडील तीन हजार वस्तू त्या संग्रहालयाला दिल्या. संग्रहालयाने पुरवार यांना मानद संचालक पद दिले. सध्या श्रीप्रकाश त्या पदावर आहेत.
श्रीप्रकाश पुरवार हे बिद्री कलावंत. सध्या ते पंचधातूच्या मूर्ती घडवण्याचे काम करतात. ते वडिलांच्या संग्रहाची निगा राखतात. त्यांना वडिलांनी जमा केलेल्या सर्व वस्तूंचा अभिमान वाटतो. त्यातून पुढील पिढ्यांना भारताच्या ऐतिहासिक वारशाची ओळख होईल अशी त्यांची भावना आहे. शांतिलाल पुरवार यांनी जमा केलेला तो वारसा लोकांपुढे यावा करता श्रीप्रकाश आणि त्यांचे दोन भाऊ, जयप्रकाश आणि ओमप्रकाश यांनी धडपड आरंभली आहे. त्या तिघांनी पैसे उभे करून त्या संग्रहाला ‘संग्रहालया’चे रूप देण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच ते संग्रहालय लोकांकरता खुले होईल.
श्रीप्रकाश पुरवार – 9423450096
(पूर्वप्रसिद्धी – दैनिक दिव्य मराठी, रसिक पुरवणी, फेब्रुवारी 2018)
– साईप्रसाद कुंभकर्ण
https://mahanagarnews.com/human-sculpture-found-for-the-first-time-in-ahmednagar-district-is-evidence-of-the-existence-of-paleolithic-man/
नगर जिल्ह्यात प्रथमच सापडले मानवी शिल्प, अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे सापडले पुरावे
अहमदनगर-
अश्मयुगीन मानव म्हटलं की नजरेसमोर येतं ते इयत्ता तिसरीच पुस्तक ‘
माणसाची गोष्ट’ हा मानव कसा होता ? काय खात होता? हे या पुस्तकातूनच आपण
शिकलो. अशाच एका अश्मयुगीन ठिकाणाचा शोध नुकताच इतिहास अभ्यासक सतीश भिमराव
सोनवणे यांनी लावला. हे ठिकाण कामरगाव जवळच्या ‘ मावलया डोंगरावर’ सापडले
आहे.
कामरगाव नगर तालुक्यातील गाव. या गावाच्या भोवती सह्याद्रीची एक तुटक रांग
आहे. यातील विठ्ठलवाडी कडून अस्तगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नगर
पुणे महामार्ग पासून साधारणतः३ किमी अंतरावर एका टेकडीला मावलयाचा डोंगर
म्हणतात. या ठिकाणाला सोनवणे यांनी दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी भेट दिली
होती . या डोंगरावर काही उभ्या शिळा ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूला
मध्ययुगीन काळातील कोणतीही मूर्ती नसलेले बांधकाम आहे. याचा बारकाईने
अभ्यास केला असता ही वेगळीच रचना असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार
अभ्यास सुरू केला. इतिहास अभ्यासक प्रा. टी. मुरुगेश यांच्या मता नुसार हे
इतिहास पूर्व कालीन थडगे असावे. ज्याचा संबंध मातृ देवतेशी असतो.
त्यानुसार आणखी निरिक्षण करण्यासाठी दुसऱ्यांदा दिनांक १० मार्च २०२४ रोजी
त्यांनी पुन्हा भेट दिली. यावेळी त्यांना काही पुरावे सापडले . त्यात सात
उभ्या शिळा होत्या , यांची मावलया नावाने पूजा केली जात आहे. या शिळांचा
आकार वेग वेगळा असून त्यावर स्थानिक लोकांनी शेंदूर लावला आहे.
सर्वात महत्त्वाचा पुरावा -मानवी प्रतिमा असलेली शिळा (कातळ शिल्प )- यातील
एका शिळेवर एका चार पायांच्या प्राण्यावर बसलेल्या मानवाचे चित्र दगडावर
कोरलेले आहे. चित्राची उंची साधारणतः २० सेमी आहे व रुंदी १५ सेमी. ज्या
प्राण्यावर माणूस बसलेला आहे त्याची मान उंच आहे यावरून तो घोडा किंवा उंट
असावा असा अंदाज आहे .
यातील माणूस वारली चित्रा प्रमाणे भासतो. डोके वर्तुळाकृती छाती आणि पोटांच्या जागी दोन त्रिकोण अशी रचना आहे.
कोकणातील काळ्या कातळावर कोरलेले हे शिल्प दख्खनच्या पठारावर नव्याने सापडत
आहेत . या शिल्पातील व्यक्ती प्राण्यावर बसलेली आहे म्हणजे ते एका वीराचे
शिल्प असले पाहिजे. या परिसरात सात अप्सरांचे अस्तित्व आहे असे स्थानिक
सांगतात. याचा संबंध सप्तमातृकांशी येतो. यावरुन कदाचित ही वीरांगना सुद्धा
असू शकते.
या परिसरात काही अश्मयुगीन दगडी हत्यारे सुध्दा सापडली आहेत. याबरोबरच अश्मयुगीन राखेची टेकडीही परिसरात सापडली आहे.
दख्खनच्या पठारावरील काळ्या कातळावरील शिल्पावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे
संशोधन करणारे सचिन पाटील यांच्या मता नुसार कठीण बेसाल्ट खडकावर असे
शिल्प नव्याने सापडत आहेत. याशोधा साठी त्यांनी सतीश सोनवणे यांचे अभिनंदन
केले आहे. राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना याबद्दल ई
मेल द्वारे कळविण्यात आले आहे. या संदर्भात अधिक संशोधन करत असल्याचे सतीश
सोनवणे यांनी सांगितले .या संशोधनास निवृत्त प्रा. एम
एन आंधळे , विक्रांत मंडपे , अर्जुन खाडे, प्रशांत साठे यांनी मोलाची मदत केली.
नगर तालुक्यातील कामरगाव येथील मावलया नावाच्या डोंगरावर पुरातन काळातील शिल्प व काही शिळा सापडल्या आहेत . इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार या परिसरात नवाश्मयुगातील मानवाचे अस्तित्व होते . याचे सखोल संशोधन झाल्यास महत्त्वाची ऐतिहासीक माहिती व पुरावे मिळू शकतील . त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत . “— सतीश सोनवणे ( इतिहास अभ्यासक , कामरगाव )
” दख्खनच्या पठारावर काळया कातळावर शिल्प कोरलेले पुरावे नव्याने सापडत आहेत . नगर जिल्ह्यात मात्र प्रथमच असे शिल्प सापडले आहे . सापडलेल्या पुराव्याचे पुरातत्त्व विभागाच्या मार्फत संशोधन केले जाईल . यातुन काही ऐतिहासिक माहिती समोर येईल . ” — सचिन पाटील ( काळ्या कातळ्यावरील शिल्पाचे आतंरराष्ट्रीय अभ्यासक , पुणे
https://www.discovermh.com/history-of-khandesh-1/
खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास –
पुरातत्वेत्यांनी गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही अवशेष सापडले आहेत.(खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास)
बी.पी.बोपर्डीकर यांनी उत्खनन केले आहे. “Early stone age site at Manegav of the Purna river, Jalgaon district Maharashtra, indian antiquity असा त्यांचा लेख इंडियन अंटीक्वेरी खंड 4 मध्ये 1970 मध्ये प्रसिद्ध झाला.
पाटणे या गावी चाळीसगाव तालुक्यातील, मध्यपुराश्म युगाच्या(middle paleolithic) म्हणजे शेवटच्या काळापासून उत्तर पुराश्म युगातील म्हणजे अप्पर पेलीओलेथिक आणि त्यापुढील मध्याश्मयुगातील म्हणजे मेझोलेथिक काळात मानवी वसाहतींचे यांचे पुरावे आढळले आहेत. पाटणे येथील उत्खननाचा रिपोर्ट बघितल्यास आपल्यास ही माहिती मिळते. पाटणे बद्दल सविस्तर वेगळा लेख लिहिन. यावरून खानदेशात इसवी सन पूर्व दिड लाख ते एक लाख वर्षे या कालावधीत मानवी वसाहत होती. गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे 1952 व
57 मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत.
लासन
(Lassen) या इतिहासकारांच्या मते संस्कृत भाषा बोलणारे लोक दक्षिण
गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरून तापीच्या खोऱ्यात शिरले व तेथून पुढे
पूर्वेकडे गेले तशीच एक वसाहत करणाऱ्यांची लाट पूर्वेकडे आल्याचे काही
उल्लेख आख्यायिका मध्ये आहेत. या आख्यायिका ग्राह्य धरल्या तर किंवा काही
कणही ग्राह्य धरले तक्ष इसवी सन पूर्व सोळाशे शतकाच्या अगोदर खानदेशातील
गडावर विविध राजपूत अधिपतींचे राज्य होते असे अनुमान करता येईल. नाशिकच्या
सातवाहन लेणीतील सातवाहन काळातील लेणीतील शिलालेखात ऋषिक हा उल्लेख आहे या
प्रदेशात सातवाहन काळात म्हणजे इसवी सन पूर्व 250 ते इ स 250 ऋषिक नावाचे
हिमालयात वस्ती करून राहणारे लोक आले. त्यांचा स्वामी कृष्ण,#कान्हा, कण्ह
असा बदल होऊन कानदेश आणि पुढे खानदेश असे नाव पडले असावे. येथील राजे अभीर
म्हणजेच मध्ययुगातील आहेत, जरी ते नंतरच्या काळात उल्लेख सापडतो तरी
सुरवातीच्या काळात वसती केली असावी.
आसिक हा ऋषिक नावाचा अपभ्रंश मानला
तर प्राचीन खिंड आसिरगडला पुष्टी मिळते. त्याविषयी सविस्तर संशोधन लेख मी
आशिरगड या पुस्तकात लिहिले आहे. ते अप्रकाशित आहे. ते व्यवसायांनी गवळी
होते. म्हणजेच कृष्णाची नाते सांगणारे काही काळ खान्देशावर त्यांनी राज्य
केले. नंतरच्या काळात चालुक्य बदामींचे ते मांडलिक दिसतात. तसेच अजिंठा
लेणी येथील शिलालेखात उल्लेख असलेले वाकाटक राजांचे मांडलिक राजे अभिर
असण्याची शक्यता दिसते. अजिंठा आणि खानदेश या संदर्भात सविस्तर लिहिले आहे.
तर नाशिक लेणीतील शिलालेखात शिवपुत्र शिवदत्त याचा पुत्र ईश्वर सेन या
राज्याची इसवी सन 419 मध्ये खानदेशावर सत्ता होती असे नाशिक लेणीतील एका
शिलालेखातून दिसून येते.
प्राचीन काळ समजून घेण्यासाठी खानदेशात असलेल्या लेणी नाशिक अजिंठा यातील शिलालेखांचा आधार घ्यावा लागतो. स्थानिकांनुसार रामायणातील रामायणकालीन शरभंग ऋषीचा आश्रम उनपदेव चोपडा येथे तालुका चोपडा आणि वाल्मिकींचा आश्रम वालझरी चाळीसगाव येथे होता. तसेच खानदेशात फिरतांना अनेक ऋषिंच्या आश्रमांचा उल्लेख येतो. कानळदा कण्व, शिंगद येथे शृंग इत्यादि अजून उदाहरणे देता येतील. यांची कथा आणि दंतकथा सांगितल्या जातात.
ऋषींचे आश्रम तसेच अजिंठा परिसर गौतम ऋषींचा म्हणून ओळखला जातो, तर महाभारतात उल्लेखलेली एकचक्रा नगरी म्हणजे आत्ताचे एरंडोल असेही सांगतात. इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व तीनशे या काळात विदर्भ खानदेशात आर्य लोक आले, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात रेणुकामाता आणि तिच्या कथा प्रामुख्याने आहे. अनेक जण तिला कुलदेवता मानतात. दंतकथांवर विश्र्वास नसला तरी काही कण सापडतात एवढं मात्र नक्की.
खानदेशाविषयी पहिला विश्वसनीय संदर्भ टॉलेमी इसवीसन 150 चा लेखनात मिळतो. टॉलेमीने फिलीट आणि कोंडली किंवा गोंडली यांचे मुळस्थान नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे असल्याचे नमूद केले आहे. ते फिलिट म्हणजे बहुतेक भिल असावेत. आजही खानदेशात बरेच भिल्ल आहेत. भारतात नंतर आलेल्या टोळ्यांनी नर्मदेकाठून भिल्लांना खानदेशात पिटाळले. त्यावेळी खानदेश हीच भिल्लांची मुख्य वसाहत झाली होती. गोंडली याचे गोंधळी या शब्दाशी जसे उच्चार साम्य आहे. तसेच गोंड्या शब्दाचीही आहे. गोंडू गवळी गोंड महार हे गोंडांचेच वंशज असावेत. त्यांची वस्ती चाळीसगाव भागात जास्त प्रमाणात आहे.
नाशिक लेण्यातील इसवीसन 419 च्या एका शिलालेखात नाशिक खान्देश भागांवर अहिरांची सत्ता होती. या काळी या भागात आहिर वंश स्थायिक झाला होता. आज अहिरांपैकी अहिर सोनार, अहिर सुतार, आहिर शिंपी इत्यादी पोटभेद जिल्ह्यात आढळतात. खान्देश शिवाय ते वायव्य सीमा प्रांत, बंगाल, मध्य प्रदेश, कच्छ व काठेवाडतही आहे. ते सिथियन वंशाचे असावेत व मध्य आशिया व पुढे सिंधू खोऱ्यातून भारतात आले असावेत. काहींच्या मते अभीर हे आर्य वंशाचे आहेत. मात्र त्यास विश्वसनीय पुरावा नाही. स्थानिक आख्यायिकेनुसार काठेवाड हे अहिरांचे मुख्य केंद्र होते व येथिल आहिरांचे यांचे बाराव्या व तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांची जवळचे राजकीय संबंध जोडले होते.
गुजरातेतील मुसलमान स्वाऱ्यांना कंटाळून अकराव्या शतकात लेवा पाटीदार व लेवा गुजर हे तापीच्या खोऱ्यात आले. अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरी वरील स्वारीच्या वेळी म्हणजे इ.स.१२९६ मध्ये मुसलमान प्रथमच या भागात आले. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठे दक्षिणेकडून तेथे आले. फारुकी राजवंशाचा संस्थापक मलिक राजा तथा राजा अहमद हा दुसऱ्या खलिफाचा वंशज होता. त्याची राजवट थाळनेरला १३७० पासून सुरू झाली. याच काळात अरब लोक या भागात आले. आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या सैन्यात बरेच अरब होते हे दिसते. याच काळात फरिश्ता या इतिहासकाराने नुसार याच काळात पहिल्या दुर्गादेवी दुष्काळात भिल्ल व कोळी वगळता बहुतेकांनी येथून स्थलांतर केले. फारुकींच्या काळात या भागाची भरभराट झाली व शेजारच्या राज्यातील बरेच हिंदू व मुसलमान या भागात येऊन स्थायिक झाले. मुगल काळात येथे भिल्ल व कुणबी यांची भरभराट झाली.
अहमदनगर आणि विजापूरच्या राजवटीचा अस्त झाल्यानंतर तेथे अराजक माजून दक्षिणेत अस्थिरता आली. खानदेशात त्या मानाने शांतता असल्याने बरेच लोक येथे येऊन राहिले. औरंगजेबाच्या कारकिर्दीत खानदेशातील काही हिंदूंनी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारला तर अनेकांना बळजबरीने मुसलमान करण्यात आले. खानदेशावर मराठ्यांची सत्ता स्थापन झाल्यावर म्हणजे १७६०-१८१८ हिंदूंना पुन्हा स्थैर्य प्राप्त झाले.
इसवीसन अठराशे तीन मध्ये भयंकर दुष्काळामुळे भिल्ल व कोळी यांच्याशिवाय इतरांनी काही काळ परत स्थलांतर केले. दुष्काळामुळे इथले जनजीवन पार विस्कळीत झाले. स्थलांतरित आणि पैकी बरेच लोक परत आलेच नाहीत. या कालखंडात येथे स्थानिक सरदारांनी उत्तर भारतातील अरब, उत्तर भारतातील परदेशी ब्राह्मण व कर्नाटकातील नाईकडा या तीन जमातींच्या सेना आपल्या पदरी बाळगल्या होत्या.
ब्रिटिश राजवट आल्यावर अठराशे अठरा मध्ये नाईकडा सैन्य हे कर्नाटकात गेले तर अरबहे हैदराबाद कडे गेले, तर काही परदेशी ब्राम्हण मात्र तिथेच शेती व्यवसाय करून स्थायिक झाले. मात्र जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाल्यावर विदर्भ व गुजरातमध्ये गेलेले मूळचे लोक परत आले.
हैदराबादचा निजाम व शिंदे यांच्या राज्यातूनही बऱ्याच लोकांनी खानदेशात स्थलांतर केले. तरीही एकोणिसाव्या शतकात बरीच दशके येथे वस्ती विरळच होती. इसवीसन १८५२ मध्ये जिल्ह्याचा बराच भाग विरळ लोकवस्तीचा होता. त्यामुळे उपजीविकेची साधने कमी असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातून लोकांना आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु एवढ्या दूर लोक यायला तयार नव्हते. उदार शेतसारा पद्धती व रेल्वे सुरू झाल्यावर नजीकच्या भागातून मोठ्या संख्येने लोक आले.इ.स.१७७४ मध्ये खान्देश मिल सुरू झाल्यावर पुणे सातारा भागातील बरेच मराठा मजूर जळगावला आले. तरीदेखील २८७२ मध्ये खान्देश इतर जिल्ह्याच्या मानाने विरळ वस्तीचा गणला जात होता.
ब्रिटिश राजवटीत आलेल्या स्थलांतरित लोकांमध्ये प्रामुख्याने मारवाडी, व्यापारीवर्ग, रंगारी व तेल कामगार वर्ग आणि मराठा व कुणबी व मजूर वर्ग येथे आला.
येथील बंजारी लोक समुद्रकिनाऱ्यापर्यंत बैलगाडीने मालाची वाहतूक करत. रेल्वे आल्यानंतर बंजारांना वाहतुकीच्या बाबतीत रेल्वे स्पर्धा करावी लागली. काहींना पारंपारिक व्यवसाय पूर्ण सोडावा लागला. तांडा नायकांची जवळ भांडवल असल्यामुळे ते व्यवसाय करू लागले व्यापार करू लागले आणि तांड्यातील बाकीचे लोक शेती व्यवसाय करू लागले. काहींनी लुटमारीचा मार्ग स्वीकारला. आता ह्या भागात झपाट्याने औद्योगिकीकरण होत असून इतर भागातील लोक येथे येत आहेत. तरीही प्राचीन व्यवस्था, प्राचीन इतिहास आणि व्यवस्था समजून घ्यायला आशिरगड तसेच अजिंठा याचा क्रमाक्रमाने अभ्यास करूया. या आधी या भागात झालेली उत्खनने आणि त्यांचा आढावा घेतल्यास बराच उलगडा होईल.खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास.
संदर्भ:
१. महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा: १९९४
२. हिस्टरी ऑफ मिडीएव्हल डेक्कन, एच.के.शेरवानी,पी.एम. जोशी
३.बी.पी.बोपर्डीकर, अर्ली स्टोन एज साईट ऑट मानेगाव ऑन दि पुर्णा रिव्हर जलगांव डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र, इंडियन अन्टिक्वरी खंड ४.
Suresh Suryawansh
https://thinkmaharashtra.com/paleolithic-cave-near-amravati/
अश्मयुगीन चित्रगुहा अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी नजीक आढळून आल्या आहेत. हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी येते. पुरातत्त्व संस्थांनी त्यांची दखल घेतली आहे. पण तरीही त्या दुर्लक्षित राहिल्या आहेत.
धारूळ हे मोर्शी तालुक्यातील आदिवासीबहुल गाव आहे. त्या गावाजवळ या अश्मयुगीन चित्रगुहा आहेत. चित्रगुहांचा शोध अमरावतीच्या सहा निसर्गप्रेमींना भटकंतीदरम्यान 2007 मध्ये लागला. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या सीमेवरील इसवी सनपूर्व पस्तीस हजार वर्षांपूर्वीचे हे अश्मयुगीन मानवी वसतिस्थान आहे.

चमूने ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोध कार्याचे सादरीकरण केले. चमूचे शोधलेख ‘पुराकला’ आणि ‘पुरातत्त्व’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयातील एक पथक काही वर्षांपूर्वी चित्रगुहा पर्यंत पोचले. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या चमूने या चित्रगुहांचे निरीक्षण करून काही निष्कर्ष काढले आहेत.

गुहांचा शोध घेणाऱ्यांमध्ये डॉ. विजय इंगोले, प्र.सु. हिरूरकर, पद्माकर लाड, मनोहर खाडे, ज्ञानेश्वर दमाहे, शिरीषकुमार पाटील यांचा समावेश आहे. त्यांची ही शोधमोहीम 2018 पर्यंत सुरू होती. त्यांनी बरेच तपशील गोळा केले. त्यानुसार मध्यप्रदेशातील भीमबेटका हे आशिया खंडातील सर्वात जुने मानवी वसतिस्थान दहा हजार वर्षांपूर्वीचे असून त्यानंतर शोध लागलेले हे मानवी वसतिस्थान त्याहूनही जुने आहे असा संशोधकांचा दावा आहे. येथे तीनशेहून अधिक शैलगृहे आणि हजाराहून जास्त शैलचित्रे व कोरीव चित्रे आहेत. लोहयुगातील भैरव किंवा भूतनाथ; तसेच, काही युद्धचित्रांचाही तेथील संपदेत समावेश आहे. आदिमानवाने या भागात चौतीस हजार वर्षे वास्तव्य केले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.
मोर्शीच्या या चित्र गुहांना जागतिक नकाशात स्थान मिळालेही, पण त्याकरता जागतिक पातळीवरील संशोधन पत्रांचे सादरीकरण आणि पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार सतत करावा लागला. दरम्यान, त्यांना या अतिप्राचीन मानवी वसतिस्थानाला ‘अंबादेवी रॉक शेल्टर’ हे नाव मिळवून देण्यातही यश आले आहे.

या चित्रगुहा भीमबेटकाच्या आग्नेय दिशेला दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत, तर अमरावतीपासून उत्तरेकडे सुमारे पंच्याऐंशी किलोमीटरवर आहेत. चित्रगुहांचा आकार तीस मीटर रुंद, दहा मीटर उंच आणि आतील भाग दहा मीटरपर्यंत आहे. या चित्रगुहांना ‘आर्ट गॅलरी’सारखे स्वरूप देण्यात आले आहे.
हा परिसर भीमबेटकापेक्षाही मोठा आहे. प्राण्यांची चित्रे गुहांमध्ये चितारण्यात आली आहेत. अमरावतीच्या चमूला सुरुवातीला अकरा गुहा गवसल्या. नंतरच्या काळात त्यांची संख्या शंभरपर्यंत पोचली आहे. या चित्र गुहांमध्ये हत्ती, एकशिंगी गेंडा, सांबर, चितळ, रानडुक्कर, रानगवा, रानकुत्रा, वाघ, बिबट्या या प्राण्यांसह जिराफ यासारख्या प्राण्यांची चित्रे काढलेली आढळून येतात. आदिमानवांनी निवाऱ्यासाठी या गुहांचा वापर करताना ही चित्रे रेखाटली आहेत. अनेक प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा या चित्रांच्या माध्यमातून जपल्या गेल्या आहेत. शिवाय, या गुहा मानवी समूहांच्या स्थलांतराच्या इतिहास संशोधनात मोलाच्या ठरू शकतात. हे दालन पुरातत्त्व विषयाची आवड असणाऱ्या लोकांपर्यंत पोचवणे आवश्यक असताना पुरातत्त्व विभागाने केवळ संशोधनाचे श्रेय घेतले अशी टीका त्या विभागावर झाली. पुरातत्त्व खात्याच्या प्रागैतिहासिक विभागाने स्वत: अन्वेषण करून या गुहा शोधल्याचा दावा केल्यावर तर या गुहा शोधून काढणारे निसर्गप्रेमी अवाक झाले !


तज्ज्ञांनी या परिसरामध्ये कुकडसा देव येथे नऊ, गायमुख परिसरात दोन चित्रित गुहा, कोसुंभ येथे दोन गुहा, अंबादेवी परिसरात दोन प्राण्यांच्या चित्रांव्यतिरिक्त या ठिकाणी लहान मुलाचे व आईचे चित्रसुद्धा सापडले आहे. ते चित्र त्या काळातील कुटुंब संस्थेशी निगडित आहे. त्यांना अभ्यास करताना पुराणकालीन, पाषाण युगातील दगडी अवजारे सापडली आहेत. त्यामध्ये छिद्र करण्याचे हत्यार, टोचण पाती, खुरचण असे नमुने आहेत. ही अवजारे तुटक्या अवस्थेत असून अवजारांचे अवशेष आहेत. त्या युगातील मानवांनी याच अवजारांचा वापर गुहा खोदून त्या पूर्णपणे तयार करण्यासाठी केला असावा असा निष्कर्ष काढण्यात आला.

ही शैलचित्रे पाहण्यासाठी भारतातील अनेक शास्त्रज्ञ आणि इतर लोक येत आहेत. त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग अमरावती जिल्ह्यातून आहे. तो परिसर पाहण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात, मात्र त्या ठिकाणी निवासाची सोय नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात पुरातत्त्व हा विषय समाविष्ट करण्यास हवा, जेणेकरून या भागात अधिक संशोधन होऊ शकेल.
विजय इंगोले, संशोधक, अमरावती. 9049844964 vtingale@gmail.com
– मोहन अटाळकर 9422157478 mohan.atalkar@gmail.com
https://laxmankatekar.wordpress.com/2020/07/07/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97/
अश्मयुग
अश्मयुग :

मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.
अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.
अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.
अश्मयुगीन कालखंड
पूर्वपुराणाश्मयुग : याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस (Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल (Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन (Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन (Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन (Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन (Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन (Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे. तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक भेद अभिप्रेत नाहीत. पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले.
मध्यपुराणाश्मयुग: यात पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात, हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे, अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत. या काळात यूरोप व पश्चिम आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहत असे. त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे. मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या काळातील दोन प्रमुख समाजगट होत. त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान हत्यार यांचाही समावेश असे.
उत्तरपुराणाश्मयुग : हा काळ सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे. यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन, सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते. नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून ज्ञात होतो. गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे (Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.
आंतराश्मयुग : ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली. क्रोमॅग्नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप) नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत. ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.
नवाश्मयुग : ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर, मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला.
मानवी जीवन
अन्न : मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते. कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत. मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर, सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.
आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली, तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.
याच्याच आसपास केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा आरंभ होय.
शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली. त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.
अश्मयुगाच्या विविध अवस्थांत मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे. एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच राहिला.
शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी, बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत असे.
समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो. हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती उपलब्ध होते.
आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना, तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती? अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष- संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना –या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे. व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील. अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी.
गटातील माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल. शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.
उत्तरपुराणयुगातील व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व महत्त्व प्राप्त झाले असावे.
एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार मिळत असावा.
नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे. म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या, तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले. आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे लोक कायमचे एकत्र राहू लागले.
दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य, कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या. यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली. आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते. अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.
शेवटी नवाश्मयुगीन समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली आहे.
वसतिस्थाने : अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते. त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien) भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात. अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा निर्णायक पुरावा ⇨ ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत, तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते. मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत. परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल. त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात काश्मीरमध्ये ⇨ बुर्झाहोम येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी) किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी निश्चित माहिती नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत नाहीत. त्या पुढे आल्या.
जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली. स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे, बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला. मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको (पॅलेस्टाइन), खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण हा आराखडा अपवादात्मक होय. एरवी गृह-
रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म- युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.
यूरोप, चीन, भारत व ईजिप्त या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये ⇨ फायूम येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते. यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात (टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.
आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले. हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती. खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय). उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत (कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले, तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
दळणवळणासाठी वाहने वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. मात्र ही प्रगती पूर्णपणे स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.
हत्यारे व आयुधे: आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव निवडू लागला.ठिसूळ
दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत, त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई. केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता. आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या, विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व-
योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा, उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा., पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती. क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून, टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले. त्यास दगड नसले तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित. हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ, सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात येऊ लागल्या.
अग्नी : तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत. यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे. अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती. गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत. अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या. स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत मिळाल्या आहेत.
उपकरणे, भांडे इ. : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते. उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको, जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही. दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही, परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.
नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला. एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व
भाजूण काढले तर तो आकार पक्का होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे, कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा. लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग यांच्या संधिकालातीलच आहे.
बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क – एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय. पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट दर्जाचे समजले जाते.
धर्म : पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार मंदिर आहे. गाभारा गोल (व्यास ९ मी.) व त्यासमोर आयताकार मंडप (लांबी १८ मी.) आहे. दोन्ही ठिकाणी घराचीच रचना थोड्याफार फरकाने मंदिरासाठी वापरलेली आहे, हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानातील नवाश्मयुगीन अवशेषांत (कटाल हयुक) हीच गोष्ट अधिक स्पष्ट दिसते. तेथील मूर्तिकाम, भिंतीवरील चित्रे व शिल्पे यांमुळे या वास्तू धार्मिक उपयोगाच्या असाव्यात हे कळते. त्या वेळी धार्मिक वास्तूंना काहीं ठळक वैशिष्ट्ये प्राप्त झाली असावी, हे उब्राइड संस्कृतीच्या अवशेषांवरून स्पष्ट होते (एरिडू व टेपे गौरा). आयताकार दालनाच्या एका टोकाला मूर्तीचे पीठ अथवा स्थंडिल आहे. बाहेरून जोते बरेच उंच ठेवीत. अनेक भित्तिस्तंभ किंवा क्षेपप्रतिक्षेप आहेत. सुमेरियन काळातील ⇨झिगुरातसारख्या मंदिराच्या वास्तूंच्या रचनावैशिष्ट्यांचा उगम येथे पाहावयास सापडतो. ह्याशिवाय दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही. तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा यांचीही माहिती आपल्याला नाही. मात्र पुरोहिताचे स्थान काय व तो काय कामे करीत असावा, याची थोडीफार कल्पना येते पण त्याच्या शक्तीचे गूढ समजत नाही.
जारणमारण यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न करावा हे स्वाभाविक वाटते. दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो. वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे (विधी) होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न स्त्रीमूर्तीवरून वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व दुसरी पुनर्जन्म आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ काढतात. गणचिन्हासंबंधीही अश्मयुगीन मानवाच्या काही विशिष्ट कल्पना होत्या. एखाद्या प्राण्याच्या अगंच्या काही विशेष शक्तींमुळे वा गुणांमुळे त्याला महत्त्व प्राप्त होऊन तो एकेका गटाचा वा कुलाचा पालक बनत असे आणि त्याची प्रतिकृती ही त्या गटाचा ध्वज किंवा निशाणी समजली जाई. ही निशाणी पतकरताना, त्या प्राण्याचे अतिमानुषी बल आपल्या पाठीशी सतत अभे राहावे, ही कल्पना त्यामागे असावी.
नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या. त्यांपैकी मातृकामूर्ती नवाश्मयुगीन अवशेषांत फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. जननक्रियेतील स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या रूपांत करण्यात येई. मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ लागल्या होत्या. कदाचित डामडौलाचा व वैभवाचा निदर्शक असा हा भाग समजता येईल. बहुतेक थडग्यांतून मातृकामूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्ती म्हणजे पूर्वी अभिप्रेत असणाऱ्या पृथ्वीमातेची मूर्त रूपे होत. खास नवाश्मयुगात उत्पन्न झालेला धार्मिक घटक म्हणजे नैसर्गिक शक्तीची (पंचमहाभूतांची) उपासना करणारा घटक होय. यापुढे शेती करू लागणाऱ्या समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी. यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे उभारण्यात आली असावीत.
या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.
अलंकरण, कला इ. : उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते. त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता. आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात. तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या, कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप) केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.
गवताचे व अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची अधिक माहिती नाही.
या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत. चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत. कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत. बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत. स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड, यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी ‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही. मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.
पूर्वपुराणाश्मयुगातील कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्या वस्तूंची केवळ नक्कल व प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे. माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित. त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला].
अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी.
भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील.
पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत.
कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत.
मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे. उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत. ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे होत. ⇨ लांघणज या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते. या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत.
भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल.
उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते.
दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो.
तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी, पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.
पहा : प्रागितिहास मृत्पात्रे मानववंश पुरावत्त्वीय उत्खनने.
संदर्भ : 1. Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958.
2. Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961. 3.
Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965. 4.
Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965. 5. Jacquetta, Hawkes
Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of Civilization History of
Mankind, Vol.1, London, 1963. 6. Leakey, L. S. B. Adam’s Ancestors,
London, 1960. 7. Mate, M. S. Misra, V. N.Indian Prehistory, Poona, 1964,
1965. 8.Piggott, Stuart, Ed. The Dawn of Civilization, London, 1961. 9.
Sankalia, H. D. Prehistory and Protohistory of India and Pakistan,
Bambay, 1963. 10. Sankalia, H. D. Stone Age Tools, Poona, 1964. 11.
Semenov, S. A. Trans. Thompson, M. W. Prehistoric Technology, London,
1964. 12. Singer, C.History of Technology, Vol. I, Oxford, 1954. 13.
Stern Philip Van Doren, Prehistoric Europe, London, 1970.
देव, शां. भा. ढवळीकर, म. के.
नगरच्या या नदीकाठी अश्मयुगीन मानव राहत असल्याचे पुरावे सापडलेत
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही इतिहासाशी निगडीत असते. मात्र हे पण हे लक्षात घ्यायला हवे की इतिहास म्हणजे काही नुसत्या सनावळ्या आणि लढायांची जंत्री नाही. या इतिहासाला देखील एक इतिहास होता, तो म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा. मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला संपूर्ण मानव जातीचा इतिहास आणि संस्कृती सांगत असतो.
आपल्याला आजकालच्या शाळेमध्ये विशेषतः इयत्ता ३ री च्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन माणसाची माहिती दिलेली आढळते. मुले अभ्यासामध्ये अश्मयुग, नवअश्मयुग, ताम्रपाषाणयुग वगैरे शब्द पाठ करतात दगडाच्या कुऱ्हाडीची, रापींची, चित्रे पुस्तकात पाहतात. परंतु पुस्तकातील दगडी ह*त्यारांची केवळ चित्रे न बघता प्रत्यक्ष दगडी कुऱ्हाड जर पाहिली तर त्या शाळेतील मुलांना प्राचीन मानवी इतिहासाबद्दल माहिती समजायला फक्त मदतच होत नाही तर त्याबद्दल जिज्ञासा देखील निर्माण होते. तसेच जर या विद्यार्थ्यांना एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रात अभ्यासाला नेले तर या विद्यार्थ्यांना देखील प्राचीन मानवी वसाहतीचे पुरावे पाहायला मिळतील आणि प्राचीन मानवाच्या वस्तीची स्थाने कशी पाहतात हे कसे ओळखायचे याबाबत नक्की माहिती मिळेल.
अशाच प्राचीन मानवाच्या नदीपात्रातील वस्तींची माहिती घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील नद्यांचे महत्त्व किती आहे याबाबत जाणून घेणे फार महत्वाचे ठरेल.

महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर पहिली तर तिचे मानवाच्या संस्कृतीच्या विकासामध्ये योगदान आपल्याला दिसून येते. मानवी शरीरात जशा धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात त्याच प्रकारे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्राचे पोषण करतात. महाराष्ट्रातील नद्यांचे योगदान मानवाच्या विकासासाठी फार मोठे कारण आहे.
याच नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते.
मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते.
आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. भारतामधील नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीची उत्तम उदाहरणे म्हणजे प्राचीन सरस्वती नदीकाठी वसलेले कालीबंगन येथे ‘घग्गर’ संस्कृतीचे अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात.
आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरूरजवळ असणाऱ्या ‘इनामगाव’ येथील घोडनदीच्या काठावर झालेल्या उत्खननात ‘माळवा संस्कृती’, ‘पुर्वजोर्वे संस्कृती’ अशा ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील विविध स्तर उत्खननात सापडले. महाराष्ट्रातील प्रवरा ही एक अत्यंत महत्त्वाची नदी. याच प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये नेवासा, दायमाबाद तसेच जोर्वे येथे अश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे पुरावे उत्खननातून मिळाले. हे उत्खनन प्राचीन मानवी वसाहती महाराष्ट्रात होत्या याचे फार मोठे पुरावे उपलब्ध करून देते.

प्रवरा नदी नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. अनेक छोटीमोठी गावे या प्रवरा नदीच्या काठावर वसलेली आहेत. मुळात नगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की गोदावरीच्या खोऱ्यामधील प्रवरा नदी आणि कृष्णा खोऱ्यामध्ये असणारी सीना नदी या दोन्ही नद्या या एकाच जिल्ह्यातून वाहतात.
या नद्यांच्या काठी मानवी संस्कृती वसत गेली आणि मानवाचा विकास होत गेला हे आपल्याला या नद्यांच्या काठावर आढळणाऱ्या मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून समजते. प्रागैतिहासिक काळापासून या संपूर्ण खोऱ्यामध्ये विविध संस्कृती नांदल्या आणि विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रात उदयाला आल्या असे आपल्याला दिसते.
अश्मयुगात माणूस भटक्या अवस्थेत होता. त्या काळामध्ये माणूस पाण्याच्या आश्रयाने राहत असे आणि आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दगडांची तो ह*त्यारे करीत असे, जुनी झालेली ह*त्यारे तेथेच टाकून तो स्थलांतर करत असे. या टाकलेल्या ह*त्यारांवर पावसाळ्यात नदी आपला गाळ जो वाहून आणते त्याचा थर या ह*त्यारांवर बसायला लागला की ही ह*त्यारे नदीपात्रातील मातीमध्ये बुजून जातात. जसजसा नदीचा गाळ कालांतराने वाहून जातो किंवा नदीपात्र हे शुष्क बनते तसे हे लपले गेलेले ह*त्यारे आणि प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा दिसू लागतात.
प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा या बऱ्याचश्या गावांमध्ये ‘पांढरी किंवा पांढर’ या नावाने प्रसिद्ध असतात. या पांढरी बऱ्याचदा नदीपात्रालगत असतात आणि या पांढरीचा थर मात्र नेहमीच्या मातीपेक्षा खूप वेगळा असतो. या पांढरीच्या टेकडामुळे बऱ्याचदा आपल्याला प्राचीन मानवी संस्कृतीचे धागेदोरे सापडायला मदत होते.

प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी ह*त्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे.
या मातीच्या खापारांवरून आपल्याला प्राचीन मानवी वसाहतींचा काळ निश्चित करता येतो.
या विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रातील नदीकाठी नांदत होत्या, त्याचे पुरावे या महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला देतात आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या पाऊलखुणा या आपल्याला धुंडाळणे फार महत्त्वाचे ठरते, कारण यातून आपल्याला प्रागैतिहासिक मानवाची प्रगती समजते आणि नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीतून आजच्या मानवाच्या प्रगतीची झलक दिसून येते.

सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर पूर्वप्रकाशित.
संदर्भपुस्तके:-
- पुरातत्वविद्या:- श्री. शां.भा.देव,१९७९
- महाराष्ट्रातील पुरातत्व:- श्री. ह.ध. सांकलिया आणि म.श्री. माटे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९७६
छायाचित्रे:-
- महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक मानवाच्या वस्तीची स्थळे.
- डेक्कन कॉलेज फिल्ड व्हीजीट दरम्यान घेतलेली छायचित्र आहेत
शिलावर्तुळांचे गूढ
ताम्रपाषाण युगानंतर लोखंडाचा शोध लागल्याने शेतीची प्रगती झाली. लोखंडी हत्याराने जंगल तोडून शेतीसाठी जमीन तयार करणे सोपे झाले. याच काळी दफनाकरिता मोठ्या पाषाणखंडाचा उपयोग करण्यात येऊ लागला, म्हणून या काळाला लोहयुग किंवा बृहदाश्मयुग किंवा लोह-बृहदाश्मयुग हे नाव देण्यात येते. या संस्कृतीचे विपुल पुरावे विदर्भात सापडले असून, काही स्थळांचे संशोधन व्हायचे आहे.
नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले
लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती






संग्रहित लेख, दिनांक 18th Sep 2018 रोजी प्रकाशित
तीन हजार वर्षांपूर्वीचे शिलास्तंभ सापडले
गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे.

चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात शिलावर्तुळ, शिलास्तंभ आढळून आले आहे. ते तीन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा अंदाज इतिहास अभ्यासक नीलेश झाडे यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्हय़ातील गोंडपिपरी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. इतिहास अभ्यासक नीलेश झाडे यांना शोधमोहिमेदरम्यान शिलावर्तुळे डोंगरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले, तर याच मार्गावरील चेक दरूर शेतशिवारात राजेश्वर देशमुख यांच्या शेतात शिलावर्तुळ आढळून आले. वर्तुळासाठी तीन दगडांचा वापर करण्यात आला आहे.
संशोधनाची गरज
नागपूरच्या पुरातत्त्व विभागाचे प्रमुख प्रियदर्शी खोब्रागडे यांनी या शिलास्तंभाची पाहणी करून ते तीन हजार वर्षांपूर्वीची असावी याला दुजोरा दिला. परिसरात उत्खनन केल्यास महापाषाण युगातील मानवाची अधिक माहिती जगापुढे येईल. उत्खनन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना भोटून निवेदन देणार असल्याचे झाडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.
विदर्भात सापडली हजारो वर्षे जुनी महापाषाणयुगीन एकाश्म स्मारकं - BBC News मराठी
विदर्भात सापडली हजारो वर्षे जुनी महापाषाणयुगीन एकाश्म स्मारकं

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/bbc
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
चंद्रपूरच्या नागभीडमधल्या शिवटेकडीला अमित भगतनं पहिल्यांदा भेट दिली, तेव्हा आपल्या हातून अशा कुठल्या पुरातन स्मारकांचा शोध लागेल असं त्याला वाटलंही नव्हतं.
पण पुढची साडेचार वर्षं अमितनं चंद्रपूर व भंडाऱ्यातील गावं पिंजून काढली आणि शंभरहून अधिक एकाश्म स्मारकं हुडकून काढली. त्यानं जमा केलेल्या माहितीने भारतीय पुरातत्व खात्याला संशोधनाची नवी दिशा दिली आहे.
खरं तर अमित एका सरकारी विमा कंपनीत प्रशासकीय अधिकारी आहे. पण इतिहासाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नाही. जिथे जाईल तिथे तो ऐतिहासिक स्थळांना भेट देतो. 2014 मध्ये चंद्रपुरात बदली झाल्यावर त्यानं अशीच नागभीडला भेट दिली होती.
अमित सांगतो, "नागभीडच्या शिवटेकडीच्या पायथ्याला काही एकाश्म स्मारकं (Menhirs) आहेत. ती पाहण्यासाठी मी तिथे गेलो आणि यासारखी अजून काही स्मारकं आहेत का? याचा शोध घ्यायला लागलो. इथल्या स्थानिकांना मी याबद्दल विचारल्यावर त्यांनी जंगलात अशी काही स्मारकं असू शकतात असं सांगितले. त्यातील काही लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मी जंगलामध्ये विविध ठिकाणी फिरलो. तेव्हा मला अशी काही ठिकाणं आढळून आली, जिथे मोठ्या प्रमाणात एकाश्म स्मारकं होती."
महापाषाणयुगात मनुष्याच्या मृत्यूनंतर त्यांची आठवण म्हणून त्या दफनस्थळी लहान मोठ्या दगडांचा खच करून त्यामध्ये एक मोठा दगड उभा केला जायचा, त्यालाच एकाश्म स्मारक किंवा शिलास्तंभ म्हणतात. चंद्रपुर-भंडाऱ्यात सापडलेली एकाश्म स्मारकं ही 1 फुटापासून ते 13 फुट उंचीची आहेत. हे सर्व अखंड शिलास्तंभ आहेत.
कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या? - BBC News मराठी
कोकणात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी कुणी काढल्या या गूढ आकृत्या?

पुरातत्वशास्त्रासाठी कोकण सध्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. कोकण त्यांना अनेक जुन्या प्रश्नांच्या उत्तरांसोबत काळाच्या उदरातल्या अनेक नव्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी मदत करणार आहे. त्याचं कारण आहेत, 'कातळशिल्पं'. किनारपट्टीलगत गेल्या काही वर्षांमध्ये सापडलेली कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या प्रवासातले नवे टप्पे समोर घेऊन येणार आहे.
कोकणतल्या रत्नागिरी-राजापूर पट्ट्यात अचानक जमिनीतून वर यावीत तशी ही कातळशिल्पं गेल्या काही वर्षांत समोर आली आहेत. याअगोदर त्यांच्याकडे कोणा पुरातत्वशास्त्रज्ञाचं लक्ष का गेलं नाही हे एक कोडंच आहे. पण काही स्थानिक देवदेवतांचं स्वरूप घेऊन, तर बहुतांश सड्यांवरच्या मातीखाली दबली गेली होती. त्यांची संख्या किती होती याचा कोणालाच अंदाज नव्हता. पण गेल्या चार-पाच वर्षांत शोधकार्य सुरु झाल्यापासून हजाराच्या घरात त्यांचा आकडा पोहोचला आणि पुरातत्वशास्त्रज्ञांची नजर उंचावली गेली
पण मुळात ही कातळशिल्पं आहेत तरी काय? कोकणातल्या सड्यांवर, म्हणजे खडकाळ भूभागांवर, कोरलेली ही चित्रं आहेत. ती अनेक प्रकारची आहेत. त्यात प्राणी आहेत, पक्षी आहेत, मानवी आकृत्या आहेत, भौमितिक रचना आहेत, नुसतेच आकार आहेत. या चित्रांवरून लगेचच समजतं की अप्रगत मानवानं अगदी प्राथमिक टप्प्यात कोरलेली ही चित्रं आहेत. मानवी संस्कृतीच्या विकासाच्या प्रवासात अशा प्रकारची कोरलेली चित्रं जगाच्या अनेक प्रदेशांत सापडतात. काही अभ्यासक त्यांना 'खोदशिल्पं' असंही म्हणतात, तर इंग्रजीमध्ये त्यांना 'पेट्रोग्लिफ्स' असं म्हणतात.
जगभरात आढळणारी कातळशिल्पं वेगवेगळ्या काळातली आहेत. अगदी अश्मयुगातली आहेत, जेव्हा माणसाकडे केवळ दगडी हत्यारं होती. चित्रकलाही अगदी प्राथमिक टप्प्यातली होती. माणसाला शब्दांची भाषा अवगतही नव्हती आणि चित्रांची भाषा तयार होण्याची सुरुवात झाली तेव्हाचीही आहेत. आणि त्यानंतर अनेक टप्प्यांत ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेलेली, नैसर्गिक रंगांचा उपयोग झालेली, चित्रांच्या भाषांतून त्या काळाची गोष्ट सांगणारीसुद्धा आहेत. रत्नागिरीत सापडणारी चित्रं बघतांनाच समजतं की इथं राहणारा माणूस हा नुकताच त्याच्या अवती भवती असणारा निसर्ग रेखाटायला लागला होता. जे तो पाहत होता, ते नोंद करून ठेवण्याची त्याच्यातली प्रेरणा जन्म घेत होती. पण त्यामुळे पहिला प्रश्न कोणालाही हा पडतो की, नेमक्या कोणत्या काळातली, किती हजार वर्षांपूर्वीची ही चित्रं आहेत? कोणत्या युगामध्ये त्यांचा समावेश होतो?

मात्र त्याचं नेमकं उत्तर अद्याप पुरातत्वशास्त्रज्ञांकडे नाही. कारण त्यासाठी ज्या दगडी हत्यारांनी ही चित्रं खोदली गेली, ती सापडावी लागतील आणि मग कार्बन डेटिंगनं त्यांचं नेमकं वय समजू शकेल. काही मोजक्या ठिकाणी ही हत्यारं सापडायला सुरुवात झाली आहेत, पण त्यांचा प्रगत अभ्यास नुकताच सुरू झाला आहे. पण या कातळशिल्पांच्या दर्शनी अभ्यासावरून आणि आजवर जगभरात इतर झालेल्या अभ्यासाच्या आधारे कोकणातल्या चित्रांच्या कालखंडाचा कयास करता येतो.
सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं - BBC News मराठी
सिंधुदुर्गात आढळली हजारो वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीतील मृतांची स्मारकं

फोटो स्रोत, Amit Samant
कोकणवासियांनो आणि पर्यटकांनो, सिंधुदुर्गात मालवणला जाताना, घुमडे या गावाजवळ माळरानावर गोल आकारात रचलेले काही मोठ्या आकारातील दगड पाहिले आहेत का? जर पाहिले असतील, तर लक्षात घ्या ते साधेसुधे दगड नाहीत.
ती गोलाकार मांडलेली 'शिळावर्तुळं' आहेत. ही आहेत उत्तर अश्मयुगातील किंवा महापाषाणीय संस्कृतीतील नागरिकांनी मृत आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकं.
अशा स्वरुपाची स्मारकं महाराष्ट्रात अडीच हजार वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. यामुळे कोकणात अश्मयुगाच्या अखेरीस नेमकी कोणती संस्कृती नांदत होती? हा नवा प्रश्न पुरातत्वज्ञांसमोर उभा राहिला आहे.
महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांत शिळावर्तुळं आढळली आहेत. या वर्तुळांचं आणि स्मृतीस्मारकांच्या नेमका काळ ठरवण्याचं (डेटींग) काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत केवळ पुणे, विदर्भ, कर्नाटक इथेच ही स्मारकं आढळली होती.
पुरातत्वज्ञांच्यामते अश्मयुगात अशा प्रकारची शिळास्मारकं उभारण्याची पद्धत रूढ होती. परंतु कोकणात अशी शिळावर्तुळं कधीच आढळली नव्हती.
कोंढा-कोसरा : वार्ताहर पवनी तालुक्यातील विरली (खंदार) गावात शासकीय जागेत स्मशानभूमीला लागून असलेल्या जागेत १५ ते २० दगडांचे गोलाकार वर्तुळात समाधी आहेत. त्यास मेनहीर (वृतसमाधी) तसेच त्यास शिलावर्तुळ असेदेखील म्हणतात. हे अवशेष महापाषाण काळातील असून, येते अशा शेकडो वृतसमाधी आढळतात. या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक प्राचीन अवशेष मिळू शकतात. हे अवशेष इतिहास पूर्व काळातील असल्याने यास विशेष महत्त्व प्राप्त होऊ शकते. मात्र महापाषाण काळातील हे ‘मेनहीर’ दुर्लक्षितच आहेत.
मागील वर्षात मार्च २०२० मध्ये येथे कडुलिंब वृक्षाला लागून असलेली बलदेवबाबा यांची पाषाणातील मूर्ती हे एक महापाषाण काळातील अवशेष असल्याचे स्पष्ट झाले. चंबुतऱ्यावर १४ फूट व जमिनीत ७ फूट खोल उत्खनन करून मिळाल्याने हे 'मेनहीर 'संपूर्ण भारतातील सर्वात मोठे असल्याची शक्यता वर्तविली होती, ती खरी ठरली आहे. त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्याने येथील उत्खनन कार्य थांबविण्यात आले. नंतर पुन्हा येथे उत्खनन कार्य केले नाही. महापाषाण काळात मृतदेह पुरण्याची प्रथा होती. इ.स.पूर्व १००० च्या आसपासचा हा काळ आहे. विरली(खं.) येथे गोलाकार शिलावर्तुळ शेकडोंच्या संख्येने आहेत. येथील गोलाकार शिलावर्तुळाच्यामध्ये एक मोडा दगड असतो. ते गावकरी लोकांनी मोठया प्रमाणात काढून टाकले, तरी काही ठिकाणी अजून जसेच्या तसे आहेत.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे बलदेवबाबा यांची मूर्ती आहे. या मूर्तीला माना समाजाचे लोक आपले कुलदैवत मानून पूजाअर्चा करतात. बलदेवबाबा मेनहीर ही २१ फूट आहे. येथे पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यास अनेक अवशेष मिळू शकतात. येथील स्मशानभूमीत शेड बांधकाम केले, त्यावेळी घराचे अवशेष मिळाले होते. यावरून येथे मानवी वसाहती अस्तित्वात होत्या. इ. स.पूर्व १००० मध्ये दक्षिण भारतात मानवीजीवन उत्तर भारताच्या तुलनेत विकसित नव्हते. तेव्हा ग्रामीण जीवन येथे अस्तित्वात होते. महापाषाण काळातील अवशेष पवनी तालुक्यात अनेक ठिकाणी मिळतात. पिंपळगाव (निपाणी), खैरी (तेलोता) येथे यापूर्वी शिलाप्रकस्थ मिळाले आहेत. त्यातील पिंपळगाव (निपाणी) येथील अवशेष पुरातत्व विभागाने आपल्या ताब्यात घेऊन तेथे अवशेषांचे सरंक्षण करण्यासाठी सुरक्षा भिंत तयार केली आहे.
विरली (खं.) खैरी (तेलोता) येथील अवशेषांना सुरक्षा भिंत बांधणे आवश्यक आहे. विरली (खं.) येथे शासकीय जागेत हे अवशेष पसरले आहेत. त्यांना संरक्षण देणे आवश्यक आहे. शिलावर्तुळ असलेल्या ठिकाणी उत्खनन केल्यास प्राचीन इतिहास पुन्हा उजेडात येऊ शकतो. तेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर येथील उत्खनन कार्य सुरू करणे गरजेचे आहे. मागीलवर्षी पुरातत्व विभाग, नागपूर डॉ. के. आर. के. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संरक्षण सहायक हेमंत हुकरे यांनी उत्खनन कार्याकडे लक्ष दिले होते. परत थांंबलेले संशोधन कार्य सुरू करण्याची मागणी होत आहे.
https://www.misalpav.com/node/50636
महाश्मयुगीन विदर्भातील मृतावशेषांबद्दलचे नवे संशोधन
विषय ओळख प्रथम परिच्छेद सोडून देव शां. भा. यांच्या महाश्मयुगीन संस्कृति या मराठी विश्वकोशातील लेखावरून.
मानवी मनाचा एक धागा प्रिय आप्त स्वकीयांच्या स्मृतींशी जुळलेला असतो. मृतांचे दहन केल्यानंतर विधी आणि प्रथा पाळल्या जातात तसे दफन केलेल्या व्यक्तींसाठीही विवीध सांस्कृतिक समुदाय प्रथा पाळत जसे मृतव्यक्ती सोबत अन्न आणि इतर वस्तु आणि बर्याचदा प्राणि पुरणे. ज्या समुदायांच्या इतिहासाचे लिखीत माध्यमातून जतन होऊ शकले नाही अशा संस्कृतींच्या प्राचीन दफनभूमींचा पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधक संशोधन आणि अभ्यास करत असतात.
प्रागैतिहासिक काळात मोठमोठ्या ओबडधोबड दगडांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा महाश्मयुगीन संस्कृती (मेगॅलिथिक कल्चर) म्हणतात. मानवी सांस्कृतिक इतिहासात महाश्मयुग वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे ठरलेले आहे. त्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत : (१) या संस्कृतीचे अवशेष जगात जवळपास सर्वत्र मिळतात आणि महाश्मयुगीन दफन पद्धतीशी संलग्न असलेल्या काही प्रथा सद्यस्थितीत काही ठिकाणी प्रचलित आहेत. (२) या संस्कृतीचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत वेगवेगळा आहे. उदा., यूरोपमध्ये या संस्कृतीचा काळ इ. स. पू. तिसरे-दुसरे सहस्रक एवढा असला, तरी भारतात उपलब्ध पुराव्यानुसार तो इ.स.पू. पहिल्या सहस्त्रकाची सुरुवात या आधी फारसा जात नाही.
महाश्मयुगीन संस्कृती समुहां नेमके कोणते होते यांची खुपशी माहिती मिळत नाही. त्यामुळे याबद्दल अभ्यासकात विविध मते प्रचलित आहेत. पण सर्व ठिकाणी ही महाश्मयुगीन स्मारके मानवी दफनाशी संबद्ध दिसतो. यूरोपातील फार मोठा प्रदेश या संस्कृतीने व्यापला आहे तथापि भारताप्रमाणेच यांची वसतिस्थाने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे या संस्कृतींशी निगडीत असलेले अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित राहिलेले आहेत.
भारतीय उपखंडातील महाश्मयुगीन अवशेषांबद्दल अद्याप फारसे विस्तृत संशोधन झालेले नाही. भारतात महाश्मयुगीन संस्कृतीचे तीन प्रादेशिक विभाग पडतात : (१) दख्खन, (२) उत्तर व वायव्य प्रदेश आणि (३) ईशान्य प्रदेश. (उत्तर भारतात फारसे अवशेष सापडलेले नाहीत) .. बलुचिस्तान आणि मकरान येथील अवशेषही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या भागातील महाश्मयुगीन दफनात एककेंद्रीय चक्राचे चित्रण असलेली मृद्भांडी, लोखंडाच्या वस्तू व घोड्याचे अवशेष सापडतात. या प्रादेशिक महाश्मयुगीन संस्कृतीचा एकमेकींशी काही संबंध होता किंवा कसे व तो असल्यास त्याचे स्वरूप काय होते, याबद्दल निश्चित पुरावा उपलब्ध नाही आणि अवशिष्ट पुराव्याबद्दलही एकमत नाही.
शिळावर्तुळ दफने सर्वांत जास्त ठिकाणी एकवटल्याचे स्थान महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील खैरबांडा हे होय. दफनातील ही विविधता बऱ्याच प्रमाणात स्थानिक रीत्या उपलब्ध असलेल्या-प्रस्तर, शिळा, दगडगोटे, फरशा या सामग्रीमुळे आलेली आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. या विविध प्रकारांना इंग्रजीत भिन्न नावे दिलेली आढळतात: केर्न सर्कल, सिस्ट सर्कल, मेनहीर, डॉलमेनॉइड सिस्ट, टोपीकल इत्यादी. .. नागपूरजवळील माहुरझरी येथील शिळावर्तुळाच्या उत्खननात लोखंडी छिन्न्या, भाले, चपट्या कुऱ्हाडी, तलवारी, कट्यारी, त्याचप्रमाणे कढ्या, बांगड्या व नखण्या मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त नक्षी असलेली तांब्याची कडी, सोन्याची कर्णफुले व कंठमाला इ. वस्तूही मिळाल्या. यांपैकी एक कट्यार वैशिष्ट्यपूर्ण असून तिचे पाते लोखंडाचे व मूठ तांब्याची आहे. या व्यतिरिक्त घोड्याच्या तोंडावर घालावयाचे व बहुधा चामड्यावर शिवलेले तांब्याच्या पत्र्यांचे बनविलेले अलंकारही घोड्याच्या अवशेषांबरोबर सापडले. मृत्पात्रांत सर्वसामान्यतः वाडगे, थाळ्या, निमुळत्या बुडाची भांडी असून त्यांच्या झाकण्यांवर कळ्यांची अथवा चार पक्ष्यांची आकृती छोट्या आकारात करून त्या झाकण्यांच्या शीर्षावर बसवल्याचे आढळून आले. (१९८० च्या दशकात झालेल्या संशोधनात या संस्कृतींचा काळ ∼2nd century BC to ∼7th century AD. वर्तवण्यात आला होता)
दफनात आढळून आलेल्या पुराव्यांवरून हे लोक भटके होते का? असा प्रश्न पडतो तथापि त्यात फारसे तथ्य नसावे. या लोकांनी तलाव बांधले, भातशेती मोठ्या प्रमाणावर रूढ केली इ. महत्त्वाच्या बाबी द. भारतातील संगम वाङ्मयातील उल्लेखावरून प्रचलित असाव्यात असे दिसते. महाश्मयुगीन दफनपद्धतीच्या काही प्रकारांचा उल्लेखही संगम वाङ्मयात आलेला आहे मात्र घरेदारे व वसाहती यांच्या स्वरूपाबद्दलचा पुरावा अद्याप फारसा उपलब्ध झालेला नाही. अगदी अलीकडे महाराष्ट्रात नागपूरजवळील नैकुण्ड व भागी माहारी या ठिकाणी झालेल्या उत्खननात या लोकांच्या गोल झोपड्यांचे अवशेष त्याचप्रमाणे लोखंड बनवायच्या भट्ट्या व गहू, तांदूळ, जव व वाटाणे या धान्यांचे अवशेष सापडले आहेत.
महाश्मयुगीन संस्कृतीचा भारतातील काळ आतापर्यंत तरी प्रामुख्याने दक्षिण भारतातील या संस्कृतीच्या संदर्भात उपलब्ध झालेल्या कार्बन-१४ कालमापनानुसार बराचसा निश्चित करण्यात आला आहे. विसाव्या शतकाच्या मध्यास सर मॉर्टिमर व्हीलर यांनी ब्रह्मगिरीच्या उत्खननाच्या आधारे महश्मयुगीन संस्कृतीचा काल इ.स.पू.सु. २०० ते इ. स. पहिल्या शतकाचा मध्य असा वर्तविला. काही महाश्मयुगीन दफनांत रोमन नाणी सापडल्यामुळे या दफनांचा अंतिम काल इसवी सनाचे पहिले शतक असा निश्चित करता येतो तथापि हल्लूर (कर्नाटक) व टाकळघाट (महाराष्ट्र) येथील पुराव्यांच्या कार्बन –१४ पद्धतीनुसार आलेल्या सनावळ्या अनुक्रमे इ.स.पू. ९५० ± १०० व ११०५ ± १०० आणि इ.स.पू. ५५५ ± ११५ व ६०५ ± ११० अशा असल्याने महाश्मयुगीन संस्कृतीचा प्रारंभकाल कमीतकमी इ.स.पू.सु. १००० इतका मागे नेता आलेला आहे.
***
याच विषयास अनुसरुन विदर्भातील उबळी (नागपूर) आणि चंद्रपूर येथील अवशेषावर आधारीत संशोधन लेख New chronology for MEGALITHIC BURIALS IN VIDARBHA Nikhil Patel अलिकडे (जुलै २०२२) प्रकाशित झालेला आहे. संशोधकांच्या मते मध्य भारतातील महाअश्मयुगीन संस्कृतीबद्दलचे हे संशोधनामुळे तेथिल संस्कृतीच्या अभ्यासास साह्य्यकारी आहेच पण सोबत दक्षिण भारतीय Neolithic-Chalcolithic सांस्कृतिक काळाच्या (∼500 BC to ∼AD 700) अभ्यासासाठी उपयूक्त ठरू शकेल. या वैदर्भीय अश्मयुगिन दफनभूमींची वैशिष्ट्ये म्हण्जे Cairn म्हणजे वर्तुळाकार दगडांनी झाकलेले असणे, अनेक मानवाशेषांसोबत पुरलेल्या घोड्यांचे अवशेष आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे. हाडांच्या अवशॅषांच्या अभ्यासास बर्याचदा मर्यादा पडतात अशावेळी दातावरील आवरण आणि मातीच्या भाडंयातील अन्नावशेश आणि हे अवशेष पुरलेली माती यांचा अभ्यास मदतीस येतो. या तिन्ही गोष्टींच्या वैज्ञानिक संशोधनातील काळ एकमेकांशी पुरेसा जुळल्याने (ओव्हरलॅप) असा एकत्रित व पद्धतशीर तौलनिक पडताळणी करणारे हे संशोधन रोचक ठरावे.
उबळी येथिल उत्खननात संशोधकांना nail-parers, spearheads, chisels, bridle bits used
for horses, a large number of aurum (archaic gold) micro disc beads, and
semi-precious stone beads. The faunal remains here consisted mainly of
horse bones and teeth. या गोष्टी मिळाल्या होत्या. तुलनेसाठी १९९५ ९६
काळात चंद्रपूर उत्खनात सापडलेल्या घोड्यांच्या दातांचाही अभ्यास केला
गेला.
हे नवे संशोधन म्हणते " However, we here presented new AMS 14 C dates
of Megalithic culture in Vidarbha region by dating equine teeth enamel
of Ubali burials (Meg-10 and Meg-33) and organic food remains recovered
from burial cooking pots. The total age range for Ubali megaliths of the
Vidarbha region is AD 250–1016 .. the regional ecosystem of Vidarbha should have experienced water stressed conditions. This
scenario is corroborated .. that during early historic times (1st–7th
century AD), the Vidarbha region was likely receiving significantly less
rainfall .. compared to today.
* पुर्वी वर्तवलेल्या (∼500 BC to ∼AD 700) काळ भाकीता पेक्षा AD 250–1016 हे काळ भाकीत संस्कृतीच्या अधिक काळाची म्हणजे इस्वी 1016 पर्यंत शक्यता वर्तवते.
* The generated isotopic data clearly indicated crop-vegetation values (C 4, millet type).
*
* प्रागैतिहासिक लेखी इतिहास उपलब्ध आहे त्या आधीचा काळ
* मी लेख विषयाचा अभ्यासक नसल्यामुळे लेखातील उल्लेखातील त्रुटींबद्दल चुभूदेघे.
* या विषयाशी अधिक माहिती उलगडण्यात कुणि मदत करू शकेल तर नक्कीच सहर्ष विनंती आणि स्वागत
* विषयास अनुसरून नसलेले, भाषा व्याकरण शुद्धलेखन विषयक प्रतिसाद न देण्यासाठी आभार.
* दुरुस्ती
'..आणि अनावशेष असलेली मातीची भांडी मिळणे.
एवजी
..आणि अन्नावशेष असलेली मातीची भांडी मिळणे.
असे वाचावे.
इसपू
५०० च्या आसपास हिंदू धर्मातून बौद्ध व जैन वेगळे झाले, याचा अर्थ
त्यावेळी हिंदू धर्म बऱ्यापैकी (किमान नर्मदेपर्यंत) सुस्थापित असावा.
चितेचा उल्लेख महाभारतात नक्की आहे. म्हणजे किमान इसपू ५०० वर्षे वा
त्याच्या आधी. म्हणजे मृत शरीराचे दहन हे देखील सुस्थापित असणार (सध्या
हिंदू धर्मातील लिंगायत आणि महानुभव पंथात दफन केले जाते. अजूनही काही
असावेत. तसेच काही पंथ त्यावेळी नक्कीच असतील. पण..)
मृत शरीरासोबत भौतिक वस्तू ठेवणे जेणेकरून मृताच्या पुढील प्रवासात उपयोगी
पडतील, हा प्रकार आता किंवा तेव्हाच्या हिंदू दफन विधीत कितपत असेल?
मृत्यूनंतर पार्थिव शरीराचे 'लाड' केले जात असतील का? कारण आत्मा अमर असतो,
आणि मृत्यूनंतर आत्मा पुढील प्रवासाला जातो, पार्थिव शरीर येथेच राहते अशी
हिंदू धर्मातील सामान्य धारणा आहे.
अवांतर : (केवळ हवेली व पुरंदर तालुक्यातील मराठा व्यक्तीच्या अंत्यसंस्काराचे निरीक्षण) - दशक्रिया विधीच्या वेळी मृत व्यक्तीला आवडणाऱ्या वस्तू - चिवडा, अंडे, टोस्ट - खारी, अगदी दारूची बाटली, तिथे ठेवल्या जातात. इतर ठिकाणी, इतर जातींमध्ये असं असतं का, माहिती नाही. हा प्रकार मृत शरीराबरोबर काही गोष्टी ठेवणं यातून पुढे आलेला असेल का?
तुषार काळभोर, विकिपीडियावरील दहन क्रिमेशन आणि मराठी विश्वकोशातील अंत्यविधी विषयक लेख पाहील्यास जागतिक इतिहासात अंत्यविधीचे अनेक प्रकार मिळतात. दहन हे भारत आणि हिंदू धर्मापुरते मर्यादीत नाही. अगदी १७००० वर्षापुर्वीचे ऑस्ट्रेलियन दहन पुरावे पुरातत्व तज्ञांना मिळाले आहेत. दुसरीकडे अगदी ऋग्वेदातही दफनाचेही उल्लेखही मिळतात, माझ्या मते धार्मीक तत्वज्ञानाच्या विकासासोबत ब्राह्मणी अंत्यसंस्कार पद्धती विकसीत होऊन सावकाश पणे काळाच्या ओघात इतर समुदायांनी त्यांचे अनुकरण केले असण्याची शक्यता अधिक असावी. आणखी एक महत्वाची बाजू (ऐतिहासिक काळात) दहन आणि दफन या दोन्ही क्रिया स्थान परिस्थिती साधनांच्या उपलब्धेतेवर निर्भर करत असाव्यात. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करावयाचे त्याच्या सोबत एखादीच व्यक्ती असेल तर ती उपलब्ध साधनांच्या मर्यादेत निर्णय घेईल जसे अग्नी उपलब्ध नसेल पण जमीन खोदण्याचे साधन असेल किंवा नैसर्गीक खड्डा उपलब्ध असेल तर पुरण्याचा विचार करेल. खड्डा आणि खोदण्याचे साधन नसेल पण अग्नी उपलब्ध असेल तर अग्नीही देईल. (नदी टेकड्या जंगलात मृतदेह सोडून देण्याचेही प्रकार होतात त्यात नदीत सोडणे हिंदू धर्मातही पुरेशा प्रमाणात होत असावे). दहन विषयक काळाचे पुरातत्वीय पुरावे अधिक कठीण जातात. हिंदू धर्मातील दहनानंतर राख आणि अस्थी नदीत सोडून देण्याच्या प्रकाराने पुरात्त्वीय अवशेष उपलब्ध्तेची शक्यता आणखीनच खालावते. पण या (दहन) पद्धती हिंदूधर्वीयातही सार्वत्रिक होण्यात बराच कालावधी गेला असावा. युद्धावर गेलेल्या राजे महाराजांना त्यांचे चेले किंवा आप्तांनी मृतदेह शोधून दहन संस्कार केले तरच इतर सैनिकांच्या खासकरून अनेक एकट्या दुकट्या सैनिकांच्या नशिबी दफन विधीच आले असण्याची शक्यता आहे.
आणि बहुधा त्यामुळेच युरोपातील आणि भारतातील अश्मयुगीन दफनस्थळात दगडांच्या खुणा ठेवण्याचे साधर्म्य दिसले तरी भारतीय दगडी खुणांच्या दफन स्थळात घोडे आणि शस्त्रांचे अवशेष पुरलेले मिळतात. मृताच्या आवडीच्या गोष्टी ठेवणे हा आत्मा जिवंत राहण्याच्या शक्यते बद्दलच्या श्रद्धेतून होतो. ते दहन केले तरी पिंडदानाच्या वेळी वचन वचन पुर्तीच्या पद्धतीने होतेच.
मी वर लेखात नमुद केले नाही पण घोड्यांच्या मृतावशेषांच्या काळाचा मुद्दा भारतीय इतिहास संशोधनात खूपच महत्वाचा समजला जातो कारण काही (खासकरून आर्य आणि वैदीक संस्कृती बाहेरून आले म्हणणारे) संशोधकांच्या मते सिंधू संस्कृतीत घोड्याचे समकालीन पुरेसे अवशेष मिळत नाहीत मग घोड्याचे उल्लेख करणारी वैदीक संस्कृती किती प्रमाणात एतदेशिय म्हणता येईल का हा एक मोठ्या वादाचा विषय आहे. मुलतः घोड्यांच्या अवशेषांबद्दल पुरातत्वीय संशोधकांनी पुरेसे संशोधन केले का हा प्रश्नही निगडीत असावा. असो.
(प्रतिसादकर्त्यांचे आभार)
दौंडजवळ ढवळीकर सरांनी केलेले इनामगावचे उत्खनन खूपच प्रसिद्ध आहे.
त्या वेळी मेल्यानंतर माणसं पुरण्याची पध्दत होती. मात्र पुरताना
घोटयाखालचा भाग कापून टाकायचे. का? तर त्या माणसाचं भूत होऊ नये म्हणून!
चार हजार वर्षांपूर्वीचे असे १३० सांगाडे सापडले. त्या वेळचे आजारही शोधून
काढता आले. असं लक्षात आलं की यातली बरीचशी माणसं मलेरियाने गेली आहेत.
मोठ्यांना पुरण्यासाठी मातीपासून बनवलेली शवपेटी असे तर म्होरक्याला एका
चार पायांच्या मातीच्या कुंडीत बसववेल्या अवस्थेत दफन केले जात असे. लहान
मुलांना दोन माठ एकमेकांना जोडून त्यात पुरण्याची व्यवस्था असे.
सामान्यांची शवपेटी
म्होरक्याची शवपेटी
लहान मुलांना असे पुरले जात असे
वर तुषार काळभोर यांनी लिहिल्याप्रमाणे महाभारतात चितेचा उल्लेख अगदी स्पष्टपणे आला आहे. पांडूच्या चितेचे वर्णन तर अगदी तपशीलवार केले आहे.
पुराणांत मात्र २ ते ७ वयापर्यंतच्या बालकांचे दहन न करता त्यांचे दफन करावे असे उल्लेख आहेत. संन्याश्याचेही दहन न करता दफन केले जात असे.
इकडे भोसरीत सुद्धा आत्ता आत्तापर्यंत एक शिलावर्तुळ अस्तित्वात होते. सद्यस्थिती जाऊन पाहिली पाहिजे, ते टिकले असेल असे वाटत नाही.
नागपूर जिल्ह्यातील माहुरझरीत आढळली चार हजार वर्षे जुनी दगडी मण्यांची फॅक्टरी
ठळक मुद्देसंरक्षित क्षेत्र जाहीर होणारपुरातत्त्व विभागाने केले उत्खनन
वसीम कुरेशी
नागपूर : उपराजधानीत झिरो माईलपासून केवळ १४ किलोमीटर अंतरावर काटोल मार्गावरील माहुरझरी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) चार हजार वर्षे जुन्या रंगीत दगडांचे मणी तयार करणाऱ्या फॅक्टरीचा शोध लावला आहे. येथे आभूषणांसाठी दगड घासून मणी तयार केले जायचे. याशिवाय ते विदेशातही निर्यात केले जायचे. येथील उत्खननात अनेक नव्या वस्तू मिळाल्यामुळे याला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास हे नागपूर सर्कलमधील १४ वे पुरातत्त्व महत्त्व असलेले संरक्षित स्थळ ठरणार आहे. (Four thousand year old stone bead factory found in Mahurzari in Nagpur district)

फेटरीत जुनापानीजवळील माहुरझरीत एका नाल्याजवळ उत्खननात हे स्थळ आढळले आहे. येथे दगडांचे दागिने बनविण्यासाठी कच्चा माल, ते तयार करण्यासाठी विशेष कक्ष, उत्पादनासाठी लागणारी दगडांपासून बनविलेली उपकरणे मिळाली आहेत. ही उपकरणे त्या काळात विदर्भात राहणाऱ्या मानवाच्या कलात्मकतेचे दर्शन घडवितात. सोबतच यावरून दगडांना कलात्मकतेने कोरण्याच्या त्या काळातील मानवाच्या युक्तीचा अंदाज येतो. येथे त्या काळात पुरलेले मानवी सांगाडेही मिळाले आहेत. पाषाणकाळात दगडांवर कोरीव काम करून त्यांना बारीक छिद्र करण्याच्या तंत्राची माहितीही येथे मिळाली, हे सुद्धा उल्लेखनीय ! एएसआयने या प्रकल्पाला सॉल्व्हेजिंग आर्कियालॉजी नाव दिले आहे. नागपूर शहराला लागून असलेल्या या पुरातन स्थळामुळे पर्यटनालाही चालना मिळणार आहे.
‘विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत मेगालिथिक व लोहयुगाच्या संस्कृतीचे स्थान आहे. माहुरझरीचाही यात समावेश आहे. या काळात शिलावर्तुळ तयार करून मृतदेह दफन केले जायचे. त्याचे सांगाडेही मिळाले आहेत. या विषयावर आम्ही अभ्यास केला होता. सध्या काही अवशेष सापडले असून, एएसआयची चमू यावर संशोधनात्मक काम करीत आहे.’
-चंद्रशेखर गुप्त, वरिष्ठ पुरातत्त्व अभ्यासक
रस्ता बनविताना आढळले होते दगड
माहुरझरीत अलीकडच्या काळात रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सुरू असलेल्या खोदकामादरम्यान रंगीत दगडांंचे दागिने तयार करण्यासाठी कोरण्यात आलेले दगड आणि कच्चा माल एएसआयच्या चमूला आढळला. तीन महिन्यांपूर्वी एएसआयची चमू या ठिकाणी वृक्षारोपणासाठी गेली होती.
http://mr.upakram.org/node/3448
शिळावर्तुळे आणि लोहयुग
शिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते. बरेचदा यात मध्यभागी एकाचे किंवा अनेकांचे दफन केलेले असते. भारतातही शिळावर्तुळे अनेक ठिकाणी दिसतात. थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांवर हा लेख जालावर मिळाला. महाराष्ट्रात माहूर येथे ती आहेत असे मी पु.नी फडक्यांच्या पुस्तकात वाचले होते. त्यांच्या मते ही पद्धत शकांची आहे. या शिळावर्तुळांमुळे त्यांची ठिकाणे निश्चित होतात.
नागपूर पासून उमरेड कडे जाणार्या रस्त्यावर काही शिळावर्तुळे आहेत. त्यात डेक्कन कॉलेज पुणे यांनी उत्खनन केले होते. उत्त्खननात मृतांचे अवशेष मिळाले. कार्बन डेटिंग मुळे त्यांचा काळ समजला तो साधारण इ.स.पूर्व ५०० असावा. (याबाबतचा दुवा वा संदर्भ मिळाला नाही. माहिती पु.नि. फडक्यांनी दिली.) याच ठिकाणी एका वर्तुळात एक भट्टी सापडली. ही भट्टी सध्या डेक्कन कॉलेज मधे आहे. या भट्टीत लोखंड तयार होत होते.
लोहयुग येणे हा तंत्रयुगातील एक मोठा टप्पा. तत्पूर्वी ताम्रयुगाचा मोठा काळ होता (? ब्रॉन्झ). पण लोहयुगानंतर लढाई(हत्यारे), शेती (लोखंडी नांगरामुळे कठीण जमिनीत शेती करता येणे.), मूर्तिकला इत्यादिंवर मोठा परिणाम झाला. मध्य भारतात लोखंडाचे खनिज आणि दगडी कोळसा असल्याने या भागात लोखंड बनवणे जास्त सोपे होते. इ.स.पूर्व १२०० मधे लोहयुग आले. कर्नाटकात या काळातले लोहयुगाचे अवशेष सापडतात. (विकीची माहिती.)
नागपूरच्या अगदी जवळ म्हणजे १०-१२ कि.मि.मधे काटोल रोड ला जुना पानी नावाचे ठिकाण आहे. काटोलरोड वर टोल नाका आहे हा टोल नाका पार केल्यावर साधारण ३ कि.मि. अंतरावर हे ठिकाण आहे. स्थानिकांना या ठिकाणाची कसलेसे (शंकराचे?) मंदिर असल्यामुळे ओळख आहे. या मंदिराच्या फाट्या समोर माळरान आहे. या माळरानावर शिळा वर्तुळे आहेत. पु.नि. फडक्यांविषय काढला, आणि इतक्या जवळ असल्याने ताबडतोब जाण्याचा निर्णय घेतला. (साधारण पणे सव्वा तासात आम्ही घरी परतलो देखिल.) या ठिकाणी कुठलेही उत्खनन झाले नाही. या जागेवर शेती होत नव्हती. याचे कारण कदाचित पुरातन दफनक्षेत्रामुळे रीतीरिवाजा पैकी हा एक भाग असेल. स्थानिकांना मात्र शिळावर्तुळांबद्दल काही माहिती नव्हती. (देवळात जाणार्या एका दोघांना आम्ही विचारले त्यावरून हा अंदाज.)
रस्ता ओलांडल्यावर जवळपास लगेचच ही शिळा वर्तुळे दिसायला लागतात. आम्ही नीट वेळ काढून गेले नसल्याने आणि चिखल असल्याने सर्व भाग नीटसा धुंडाळला नाही. (परत जाऊन किती वर्तुळे, काय मापे अशी मोजमाप करण्याचा विचार आहे.) याशिवाय सोबत कॅमेरापण नेला नव्हता. तेव्हा छायाचित्रे मोबाईल कॅमेरातूनच काढता आली. जमीनीवर दीड दोन फूट उंच (आत किती माहित नाही.) अशा शिळा वीस फुटाच्या व्यासात मांडून ठेवल्या होत्या. दगड एवढे मोठे की काही कारण नसले तर कोणी त्यांना हलवणार नाही. एवढ्या वर्षांनंतर त्यांचा आराखडा बदलला नव्हता. दगडातच भोके करून तेल (चरबी) आणि वात लावण्याचे ठिकाण होते. या ठिकाणा बद्द्ल माहिती सांगताना पु.नि.फडके रंगून गेले होते.
पु.नि.फडक्यांनी लिहिलेल्या शकांसंबंधीच्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी लिहिले होते. त्यांच्या लेखांचा दुवा त्यांनी मला यावेळी दिला. लोखंडाच्या खनिजापासून लोखंड तयार करण्यासाठी जास्त तापमान आणि हवेशी संपर्क टाळणे या दोन महत्वाच्या गोष्टी असतात. (तांब्यासाठी या अडचणी कमी असतात.) लोहखनिज आणी दगडी कोळशाची पूड मातिच्या कुपीत भरून भट्टीत टाकायची. आणि तापमान वाढले की लोहखनिजातील ऑक्सिजन कार्बनशी संयोगित होतो आणि लोहाचा रस आणि कर्बद्विप्राणिद बाहेर पडतो. असे काहीसे ते वर्णन करीत होते. या काळातील भारतीय लोखंड जगभर (तेव्ह्याच्या जगाच्या व्याप्तित) जात असे. आणि ते अतिशय प्रसिद्ध होते. शिळावर्तुळातल्या शिळेवरच्या पणत्यांच्या भोकांमधे लोखंडी हत्यार वापरले असणार. एवढेच नाही तर या शिळांना कदाचित तासून (एकसारख्या आकाराच्या होईपर्यंत) ठेवले होते. या दोन्ही लोहयुगाच्या खुणा येथे होत्या.
थिरुपोरुर येथील शिळावर्तुळांबाबत वाचताना हे जाणवले की अशी ठिकाणे असली तरी त्याचे उत्खनन होत नाहीत. कारण आर्किऑलॉजिकल विभागाकडे एवढा पैसा नाही. जुनापानी येथील शिळावर्तुळे देखिल उत्खननास कधी येतील हे माहित नाही. स्थानिक आख्यायिकांमुळे कदाचित ही अद्याप टिकून आहेत. पण पुढील काळात वाढत्या शहराच्या गरजांमुळे लुप्त देखिल होऊ शकतात.
प्रमोद
येसंबा येथे सापडली 71 शिलावर्तुळे
https://www.tarunbharat.net/Encyc/2023/4/30/71-stone-circles-found-at-Yesamba-Shila.html
भारतातील प्रामुख्याने दक्षिण भारत विदर्भात विविध ठिकाणी झालेल्या (Yesamba Shila) खणनातून हे समोर आले आहे की, तत्कालीन समाजात मृत पूर्वजांना अत्यंत आदरपूर्वक व विशिष्ट पद्धतीने जमिनीत पुरवण्याची पद्धत प्रचलित होती. ज्यात मृत व्यक्तीशी संबंधित लोखंडी, ताम्र व मिश्रधातूची अवजारे, कधी कधी पशु सुद्धा व्यक्तीसोबत दफन करत होते, असे अन्य ठिकाणांच्या प्रत्यक्ष उत्खननातील पुराव्यावरून लक्षात आले आहे. वर्धा नजीकच्या येसंबा येथे अशाच प्रकारची पद्धत प्रचलित असावी, असे संशोधक ओशीन बंब म्हणाले. विदर्भात अशी महापाषाण संस्कृतीची लोहयुगीन अनेक स्थळे अस्तित्वात आहेत. वर्धा नजीकच्या येसंबा येथील प्राचीन अवशेषांच्या शोधामुळे विदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशा महापाषाण संस्कृतीच्या स्थळाचा शोध लागला आहे.
ब्रिटिशांनंतर नागपूर विद्यापीठ, डेक्कन कॉलेज पुणे व महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे Yesamba Shila वेगवेगळ्या ठिकाणी संशोधन सुरू आहे. वर्धा नजिकच्या येसंबा येथे सापडलेल्या शिलावर्तुळाच्या रचनेमध्ये बाहेर मोठे दगड वेगवेगळ्या आकाराचे असून आतमध्ये लहान दगडांनी भरलेले दिसून आले. कदाचित पुनर्जन्म आणि मृत व्यक्तीबद्दल आदरभाव कारणांमुळे तत्कालीन ग्रामीण संस्कृतीमध्ये ही विशेष दफनविधी परंपरेने प्रचलित होती. येसंबाच्या शिलावर्तुळाच्या आकारावरून व मिळालेल्या दफन सामग्रीवरून व्यक्तीच्या सामाजिक स्तराचा परिचय होतो, असे काही अभ्यासकांचे मत आहे.
येसंबा येथील ही शिलावर्तुळे (Yesamba Shila) संरक्षित असणे आवश्यक आहे. कारण गिट्टी- मुरुम यांचा अतिरेकी उपसा वाढत गेल्यामुळे हा वारसा धोक्यात आल्याचे दिसून येते. ही शिलावर्तुळे शोधण्यासाठी स्थानिक रहिवासी पंचशील थूल यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे संशोधक ओशिन बंब यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. या शोधकार्यावर ओशिन बंब यांचा संशोधन लेख नुकताच ’जर्नल ऑफ हिस्ट्री आर्किओलॉजी अँड आर्किटेक्चर 31 डिसेंबर 2022 च्या विशेष अंकात प्रसिद्ध झाला आहे.
हे चक्रव्यूह व्यापारी व्यापाऱ्यांसाठी दिशा चिन्ह म्हणून काम करतात. भूलभुलैया अनेक संस्कृतींमध्ये प्रजनन प्रतीक म्हणून संबंधित आहेत आणि लोकांसाठी ध्यान साधन म्हणून देखील काम करतात. स्थानिक लोक त्यांना 'कोडे' (कोडे) म्हणून संबोधतात, परंतु वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये त्यांना 'चक्रव्यूह', 'मंचक्र' आणि 'यमद्वार' असेही म्हणतात.कोल्हापूर जिल्ह्यात आणखी चक्रव्यूह सापडण्याची शक्यता आहे.
चक्रेश्वरवाडी-प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे गाव
(०३ सप्टेंबर २०१५) चक्रेश्वर वाडी कोल्हापूरपासून साधारण ४१ किलोमीटर अंतरावरील गाव राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे असे दोन मार्ग या गावास जातात.आता शिवगडाच्या भ्रमंतीच्या निमित्ताने या भागात आल्यामुळे तिकड जायचे ठरवले. सुरेश पाटील यांनी आम्ही तिकडे जाणार आहोत म्हटल्यावर आम्हाला त्याच्या गावातूनच चक्रेश्वरवाडीस जाणारा एक जवळचा मार्ग सांगितला व आम्ही निघालो. चक्रेश्वरवाडीकडे या गावातील पांडवकालीन शिवमंदिराविषयी मी ह्या आदी ऐकून होतो. पण जाताना राजेश पाटील सरानी ह्या गावात अश्मयुगीन खडक आहेत अशी माहिती दिली. व ईथे तापसा गुंफा हि आहेत अशी माहिती सांगितली. त्यामुळे आता उत्सुकता आणखीन वाढली होती. कसबा तारळे - गुडाळवाडी - खिंडी व्हरवडे या मार्गाने आम्ही जात होतो. वाटेत एक छोटासा घाट हि लागला तिथून राधानगरीचे अप्रतिम सोंदर्य दिसत होते. आजूबाजूचाही निसर्ग हि अप्रतिम होता. साधारण १० किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो चक्रेश्वरवाडीत. गावाच्या सुरवातीसच एक आजोबा भेटले गाड्या थांबवून त्यांच्या कडे पांडवकालीन मंदिर कुठे आहे याची विचारपूस केली. त्यानंतर राजेश सरानी त्यांना त्या अश्मयुगीन खडकांविषयी विचारले. पण त्यांनी सांगितले को खूप जुन्या काळातील ती दगडे आहेत व त्या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्या आहेत. त्यामुळेच ह्या गावास चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले. बाकी त्यांनी आणखी थोडी माहिती सांगितली पण खेडेगावांमध्ये दंतकथा हि खूप असतात अशीच थोडीफार माहिती त्या आजोबांनीही सांगितली. आम्ही प्रथम गेलो पांडवकालीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर जुने व हेमाडपंथी स्वरूपाचे होते. एका छोट्या दरीच्या कड्यावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोरच भव्य मोठी अशी दीपमाळ उभी होती. त्यानंतर थोडे खाली पायऱ्या उतरून गेले कि आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातास एका छोट्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे. अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती सभामंडपातील नंदीच्या पाठमोरी बसलेली आहे. ह्या सभामंडपात नंदीच्या एकसलग अशा ३ मूर्ती आहेत व त्यांच्या मागे गणपती बाप्पा. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर उभा आहे. सभामंडपातील उजव्या हातास पुन्हा ३ मुर्त्या उभ्या आहेत. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे .मंदिराच्या बाहेर डाव्या हातास एक पिण्यायोग्य पाण्याचा कुंड आहे. त्याशेजारीच पुन्हा एक छोटे मंदिर आहे. त्या बाहेरही काही शिळा व नागेश्वराची मूर्ती आहे. तसेच मंदिरासमोरील एका सिमेंटच्या कठड्यावर काही ४ ते ५ शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले व बाहेर आलो.तिथे मंदिराच्या इतिहासाविषयी काही लोकांकडे विचारणा केली पण कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मंदिरातून बाहेर आलो व समोर उभ्या असलेल्या काही मंडळींना त्या अश्मयुगीन दगडांविषयी विचारणा केली त्यांनी समोरच बोट करून एक छोटी टेकडी दाखवली त्या टेकडीवर ते खडक होते.आम्ही मुख्य रस्त्यास आलो समोरच एक दगडी विहीर होती तिथूनच एका कच्चा रस्ता टेकडीकडे जात होता. आम्ही गाड्या घेऊन गेलो त्या रस्त्याने पण गाड्या निम्म्या वाटेपर्यंतच गेल्या. तिथून पुढे मात्र चालत गेलो. टेकडीवर पोहोचताच एक छप्पर नसलेले छोटे दगडी बांधकामातील देऊळ दिसले. देवळाशेजारीच एक मोठे व उंच झाड आहे. ह्या टेकडीवरील हे एकच सर्वात उंच झाड आहे. खालून गावातून सुद्धा लोक ह्या झाडाची खून सांगतात व त्याखाली हि दगडे आहेत अशी माहिती देतात. ह्या झाडाभोवती दगडी कट्टा हि बनवण्यात आला होता. देवळासमोर लांबलचक व मोठ्या दगडांची रास लावून चौकोण तयार केला आहे. आजूबाजूस सर्व लहान लहान झुडपे आहेत. या मंदिराच्या आत पहिले तर दोन मोठी दगडे जमिनीत रुतली होती व त्या दगडांवर काही ठिकाणी पूर्ण गोल व काही ठिकाणी अर्धवट गोल असे चक्राच्या स्वरूपात कोरले होते. तिथे कुणीतरी फुले वाहून पूजा हि केली होती तर काही पितळी घोड्याच्या लहान मूर्ती हि ठेवल्या होत्या आम्हाला नेमके काय ते समजलेच नाही. मग आम्ही बाकीची दगडे शोधू लागलो कारण राजेश सरांकडे असलेल्या पुस्तकामध्ये त्या दगडांचे व त्यावरील काही वेगळ्या प्रकारच्या खुनांचे फोटो होते. आम्हाला ती दगडे पाहायची होती. टेकडीचा आकार लहान होता पण खूप झाडी होती. आम्ही शोधत शोधत टेकडीच्या मधोमध पोहोचलो तिथे दगडांचे गोल असे उंचवट्यासारखे काही बनवले होते ते हि न समजण्यासारखे. खूप वेळ शोधाशोध केली पण ती दगडे काही सापडली नाहीत. समोरच शेतामध्ये काही मोर मात्र दिसले. पुन्हा त्या छप्पर नसलेल्या मंदिराजवळ पोहोचलो. वेळ हि खूप झाला होता अजून तापसा लेणी हि पाहायची होती. त्यामुळे खाली जाऊ लागलो व उताराच्या वाटेस थोर अंतर गेल्यावर बंडूला एका दगडावर काही खुणा दिसल्या. आम्ही लगेच तिथे पोहोचलो व पाहू लागलो तर तेथील सर्व दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा अर्ध चक्रे काढली होती हि सर्व दगडे टेकडीवरील त्या मंदिराच्या मागील बाजूस उतारतीस होती. आम्ही राजेश सरांकडे असलेल्या पुस्तकात जे फोटो पहिले होते तशा प्रकारचीच सर्व दगडे होती ती. या ठिकाणाविषयीची आम्हाला मिळालेली माहिती अशी कि चक्रेश्वरवाडी या गावात अशमयुगीन, तसेच प्राचीन संस्कृतीच्या विविध टप्प्यातील अवशेष सापडले आहेत येथे प्राचीन शिवलिंगाचे अवशेष सापडले आहेत चक्रेश्वरवाडी तसेच शिलावर्तुळाकार टेकडी व तापसा गुंफा हा अडीच कि.मी. चा परिसर अभ्यासकांसाठी खजिना आहे या शिलावर्तुळाकार टेकडीवर शिलावर्तुळाकार असलेले अनेक दगड आढळतात हि टेकडी आशमयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. आणखी काही दगडे पाहायची होती. पण सूर्य मावळतीला लागला होता पुन्हा नंतर कधी तरी यायचे हा विचार करून परत गावात आलो. व तपास लेण्यांची विचारणा केली तर माहिती मिळाली कि लेणी थोड्या लांब अंतरावर होती व गाडी हि जात नव्हती चालत जाण्यास साधारण २० मिनिटे लागणार होती व तेवढ्यात अंधार हि पडला असता म्हणून मग पुन्हा नंतर परत एकदा या गावात भटकंतीला यायचे हे मनात पक्के केले व लागलो पुन्हा परतीच्या प्रवासाला कोल्हापूरकडे ............. समाप्त......... सागर उर्फ साताप्पा स. कडव शिवशक्ती प्रतिष्ठान परिवार, कोल्हापूर (महाराष्ट्र) संपर्क नं - ९९२२२७३४१९ #गोष्टी_भटकंतीच्या #शिवशक्तीच्या #सह्याद्रीच्या_वाटेवरच्या #गडकोटांच्या #महाराष्ट्राच्या #इतिहासाच्या #गूढरम्य_ठिकाणांच्या....चक्रेश्वरवाडी प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे गाव :-
कोल्हापूरपासून साधारण ४१ किलोमीटर अंतरावरील गाव राधानगरी मार्गे किंवा गारगोटी मार्गे असे दोन मार्ग या गावास जातात.आता शिवगडाच्या भ्रमंतीच्या निमित्ताने या भागात आल्यामुळे तिकड जायचे ठरवले.चक्रेश्वरवाडीकडे या गावातील पांडवकालीन शिवमंदिराविषयी मी आदी ऐकून होतो.कसबा तारळे गुडाळवाडी खिंडी व्हरवडे या मार्गाने आम्ही जात होतो. वाटेत एक छोटासा घाट हि लागला तिथून राधानगरीचे अप्रतिम सोंदर्य दिसत होते.आजूबाजूचाही निसर्ग हि अप्रतिम होता.साधारण १० किलोमीटरचा प्रवास करत आम्ही पोहोचलो चक्रेश्वरवाडीत. गावाच्या सुरवातीसच एक आजोबा भेटले गाड्या थांबवून त्यांच्या कडे पांडवकालीन मंदिर कुठे आहे याची विचारपूस केली.पण त्यांनी सांगितले को खूप जुन्या काळातील ती दगडे आहेत व त्या दगडांवर चक्रासारख्या काही खुणा कोरल्या आहेत. त्यामुळेच ह्या गावास चक्रेश्वरवाडी असे नाव पडले असेही त्यांनी सांगितले.बाकी त्यांनी आणखी थोडी माहिती सांगितली पण खेडेगावांमध्ये दंतकथा हि खूप असतात अशीच थोडीफार माहिती त्या आजोबांनीही सांगितली.आम्ही प्रथम गेलो पांडवकालीन शिवमंदिरामध्ये हे मंदिर जुने व हेमाडपंथी स्वरूपाचे होते. एका छोट्या दरीच्या कड्यावर हे मंदिर उभे होते. मंदिराच्या समोरच भव्य मोठी अशी दीपमाळ उभी होती. त्यानंतर थोडे खाली पायऱ्या उतरून गेले कि आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करताच डाव्या हातास एका छोट्या मंदिराच्या गाभाऱ्यात देवी देवतांच्या अनेक मूर्ती ठेवलेल्या आहेत. तिथूनच पुढे मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते ते गणपती बाप्पांचे. अतिशय सुंदर अशी गणरायाची मूर्ती सभामंडपातील नंदीच्या पाठमोरी बसलेली आहे. ह्या सभामंडपात नंदीच्या एकसलग अशा ३ मूर्ती आहेत व त्यांच्या मागे गणपती बाप्पा. मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून हेमाडपंथी रचनेच्या अनेक खांबांवर उभा आहे. सभामंडपातील उजव्या हातास पुन्हा ३ मुर्त्या उभ्या आहेत. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात श्री शंभू महादेवाचे शिवलिंग आहे .
मंदिराच्या बाहेर डाव्या हातास एक पिण्यायोग्य पाण्याचा कुंड आहे. त्याशेजारीच पुन्हा एक छोटे मंदिर आहे. त्या बाहेरही काही शिळा व नागेश्वराची मूर्ती आहे. तसेच मंदिरासमोरील एका सिमेंटच्या कठड्यावर काही ४ ते ५ शिवपिंडी ठेवलेल्या आहेत. आम्ही शंभू महादेवाचे दर्शन घेतले व बाहेर आलो.तिथे मंदिराच्या इतिहासाविषयी काही लोकांकडे विचारणा केली पण कुणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मंदिरातून बाहेर आलो व समोर उभ्या असलेल्या काही मंडळींना त्या अश्मयुगीन दगडांविषयी विचारणा केली त्यांनी समोरच बोट करून एक छोटी टेकडी दाखवली त्या टेकडीवर ते खडक होते.आम्ही मुख्य रस्त्यास आलो समोरच एक दगडी विहीर होती तिथूनच एका कच्चा रस्ता टेकडीकडे जात होता. आम्ही गाड्या घेऊन गेलो त्या रस्त्याने पण गाड्या निम्म्या वाटेपर्यंतच गेल्या. तिथून पुढे मात्र चालत गेलो. टेकडीवर पोहोचताच एक छप्पर नसलेले छोटे दगडी बांधकामातील देऊळ दिसले. देवळाशेजारीच एक मोठे व उंच झाड आहे. ह्या टेकडीवरील हे एकच सर्वात उंच झाड आहे. खालून गावातून सुद्धा लोक ह्या झाडाची खून सांगतात व त्याखाली हि दगडे आहेत अशी माहिती देतात. ह्या झाडाभोवती दगडी कट्टा हि बनवण्यात आला होता. देवळासमोर लांबलचक व मोठ्या दगडांची रास लावून चौकोन तयार केला आहे.आजूबाजूस सर्व लहान लहान झुडपे आहेत.या मंदिराच्या आत पहिले तर दोन मोठी दगडे जमिनीत रुतली होती व त्या दगडांवर काही ठिकाणी पूर्ण गोल व काही ठिकाणी अर्धवट गोल असे चक्राच्या स्वरूपात कोरले होते. तिथे कुणीतरी फुले वाहून पूजा हि केली होती तर काही पितळी घोड्याच्या लहान मूर्ती हि ठेवल्या होत्या आम्हाला नेमके काय ते समजलेच नाही. मग आम्ही बाकीची दगडे शोधू लागलो पुस्तकामध्ये त्या दगडांचे व त्यावरील काही वेगळ्या प्रकारच्या खुनांचे फोटो होते.
आम्हाला ती दगडे पाहायची होती. टेकडीचा आकार लहान होता पण खूप झाडी होती.आम्ही शोधत टेकडीच्या मधोमध पोहोचलो तिथे दगडांचे गोल असे उंचवट्यासारखे काही बनवले होते ते हि न समजण्यासारखे. खूप वेळ शोधाशोध केली पण ती दगडे काही सापडली नाहीत. समोरच शेतामध्ये काही मोर मात्र दिसले. पुन्हा त्या छप्पर नसलेल्या मंदिराजवळ पोहोचलो. वेळ हि खूप झाला होता अजून तापसा लेणी हि पाहायची होती. त्यामुळे खाली जाऊ लागलो व उताराच्या वाटेस थोर अंतर गेल्यावर एका दगडावर काही खुणा दिसल्या. आम्ही लगेच तिथे पोहोचलो व पाहू लागलो तर तेथील सर्व दगडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा अर्ध चक्रे काढली होती हि सर्व दगडे टेकडीवरील त्या मंदिराच्या मागील बाजूस उतारतीस होती. आम्ही पुस्तकात जे फोटो पहिले होते तशा प्रकारचीच सर्व दगडे होती ती. या ठिकाणाविषयीची आम्हाला मिळालेली माहिती अशी कि चक्रेश्वरवाडी या गावात अशमयुगीन, तसेच प्राचीन संस्कृतीच्या विविध टप्प्यातील अवशेष सापडले आहेत येथे प्राचीन शिवलिंगाचे अवशेष सापडले आहेत.चक्रेश्वरवाडी तसेच शिलावर्तुळाकार टेकडी व तापसा गुंफा हा अडीच कि.मी. चा परिसर अभ्यासकांसाठी खजिना आहे. या शिलावर्तुळाकार टेकडीवर शिलावर्तुळाकार असलेले अनेक दगड आढळतात हि टेकडी आशमयुगीन दफनभूमी असण्याची शक्यता आहे. आणखी काही दगडे पाहायची होती. पण सूर्य मावळतीला लागला होता पुन्हा नंतर कधी तरी यायचे हा विचार करून परत गावात आलो. व लेण्यांची विचारणा केली तर माहिती मिळाली कि लेणी थोड्या लांब अंतरावर होती व गाडी हि जात नव्हती चालत जाण्यास साधारण २० मिनिटे लागणार होती व तेवढ्यात अंधार हि पडला असता म्हणून मग पुन्हा नंतर परत एकदा या गावात भटकंतीला यायचे हे मनात पक्के केले व लागलो पुन्हा परतीच्या प्रवासाला कोल्हापूरकडे
































































No comments:
Post a Comment