महाराष्ट्र हे भारतातील एक पुरोगामी, प्रगत व समृद्ध,सांस्कृतिक वारसा लाभलेले राज्य आहे.मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे .सध्याचा गुजरात व महाराष्ट्र राज्याचे मिळून १ नोव्हेंबर १९५६ रोजी दुवैभाषिक मुंबई राज्य स्थापन झाले.त्यानंतर मध्य प्रांतातून विदर्भ व हैदराबाद राज्यातून मराठवाडा मुंबई राज्याला जोडून १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राचे स्थान १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर अक्षांश व ७२.६६ पूर्व ते ८०.९ पूर्व रेखांशांच्यादरम्यान आहे.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ.कि.मी.असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान व मध्य प्रदेशानंतर देशात तिसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी ८०० कि.मी व उत्तर दक्षिण ७०० कि.मी असून महाराष्ट्रात सध्या एकूण ३६ जिल्हे व ३५८ तालुके आहे.महाराष्ट्राला एकूण ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राची पुढील सहा प्रशासकीय विभागात विभागणी केली आहे.कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , अमरावती व नागपूर . २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ इतकी आहे.
‘महाराष्ट्र’ या नावाने प्रसिद्ध असलेले आपले राज्य खूप प्राचीन काळापासून या नावाने ओळखले जाते. अर्थात त्यावेळी त्याचा भौगोलिक विस्तार किती होता याविषयी विविध मते आहेत. प्राचीन काळात रट्ठ नावाची एक जमात येथे राहत होती. त्यांच्या पराक्रमामुळे ते ‘महारट्ठ’ (महान रट्ठ) म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होत होत ‘महाराष्ट्र’ नाव झाले असावे अशी एक समजुत आहे. तसेच ‘महाराष्ट्र’ हा उल्लेख इतिहासात इसवी सन दुसऱ्या शतकापासून मिळाला आहे,असेही मानण्यात येते. महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात (इ.स. ५०५) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. ६११ सालातील बदामीच्या शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे. दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश. दक्षिणेकडील प्रदेशाची नीटशी कल्पना उत्तरेकडील आर्यावर्तांत राहणार्या आर्यांना नसल्यामुळे त्यांनी या अज्ञात प्रदेशाला दिशादर्शक असं मोघम नाव दिलं.
इसवी सन सातव्या शतकात भारतभेटीवर आलेल्या ह्युआन श्र्वांग या चिनी मुसाफिराच्या पुस्तकात महाराष्ट्राचा संदर्भ आला आहे.हे झाले ‘महाराष्ट्र’ या नावाबद्दल.पण अश्म युग,ताम्रपाषाण युग इतक्या प्रागैतिहासिक काळात महाराष्ट्राचे अस्तित्व असल्याचे पुरातन संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांना महाराष्ट्रात अनेक पुरातन जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. देश, राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात. परंतु पूर्वीच्या काळी गणराज्ये होती. प्राचीन काळी ‘आर्यावर्त आणि ‘दक्षिणपथ' असे भारताचे दोन विभाग होते. उत्तरेत ‘आर्य व दक्षिणेत ‘द्रविड' लोक राहत असत. विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला ‘दक्षिणपथ' म्हटले जाई. यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर्त, अपरांत, कुंतल वं देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो. सर्वप्रथम कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र' या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आहे. इ. स. पू. तिस-या शतकात सम्राट अशोकाच्या काळात महारठ्ठ' प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातुन प्राप्त होतो. इ. स. पू. दुस-या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात महारठ्ठ असा उल्लेख आढळतो. इ. स. ३६५ च्या मध्य प्रदेशातील ‘फेरण' स्तंभालेखात राजा श्रीधर वर्माचा सेनापती ‘सत्यनाग हा स्वत:ला महाराष्ट्री म्हणवतो. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचे आढळते. डॉ. भांडारकरांनी असे मत मांडले आहे की, ‘रठ्ठ' या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रीक असून ‘भोज' स्वत:ला महाभोज म्हणत असत. तसेच राष्ट्रीक' आपणास महाराष्ट्रीक म्हणत असत. महाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून व वंशावरून पडले नसून ते प्रदेशाच्या विस्तारावरून पडले, असे मत पा. वा. काणे यांनी मांडले आहे. संस्कृतीविषयी इंग्लिशमधून बोलताना दोन वेगवेगळे शब्द वापरले जातात – कल्चर आणि सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन हा सिव्हिल म्हणजे नागर होण्याच्या दिशेने झालेला प्रवास, प्रक्रिया आहे तर कल्चर हा त्या प्रक्रियेचा आविष्कार आहे. मराठीमध्ये सरसकट संस्कृती हा एकच शब्द वापरला जातो. पण ‘सिंधु संस्कृती’ आणि ‘मराठी संस्कृती’मधल्या ‘संस्कृती’ या शब्दांच्या अर्थामधला फरक संदर्भाने माहीत असतो. नागरीकरण याचाच अर्थ रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत होण्याची प्रकिया. जीवनाच्या विविध अंगांवर होणारे संस्कार. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि त्याबरोबर तंत्रज्ञानामध्ये होणारे बदलही.
पुरातत्वीय संशोधन :-
सहसा महाराष्ट्राचा सर्वात प्राचीन इतिहास म्हणजे आपल्याला सातवाहन काळातली लेणी वगैरे माहित असतं. ज्यांना थोडाफार जुनी पुस्तकं धुंडाळायचा नाद असतो त्यांनी महाराष्ट्राचे आद्य रहिवासी कोण? शक/नाग/आभीर, पुराणांतरींचे पुरावे काय सांगतात? वगैरे चर्चा वाचलेल्या असतात. पण या सगळ्या माहिती-चर्चा-वादाच्या जंजाळात पुरातत्वीय पुरावे सर्वसामान्यांपर्यंत फारसे चटकन पोचत नाहीत आणि अद्ययावत शास्त्रीय माहितीबद्दल बहुतांशी वाचक अनभिज्ञच रहातात. हे असं पुरातत्वीय संशोधन महाराष्ट्राच्या जडणघडणीबद्दल, इथल्या आद्य रहिवाशांबद्दल, त्यांच्या जीवनशैलीबद्दल काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी, सगळ्यांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेखनप्रपंच. (इथे लिहिलं आहे त्यापलिकडे अजून संशोधन फारसं झालेलं नाही. जे झालंय/चाललंय ते प्रकाशित झालेलं नाही. जेव्हा होईल तेव्हा इथे अपडेट मारेनच. तेव्हा इथे जे लिहिलंय ते सध्यापुरतं अंतिम सत्य मानायला हरकत नाही)
मुळात महाराष्ट्राच्या इतिहासाची साकल्याने चर्चा इतिहासाचार्य राजवाडे, राजारामशास्त्री भागवत आणि ज्ञानकोशकार केतकर यांनी सुरू केली. याच्या थोडं आधीपासूनच भाऊ दाजी लाड, भगवानलाल इंद्रजी, जॉर्ज ब्यूह्लर (Bühler) इत्यादी इंडॉलॉजिस्ट्सनी प्राचीन इतिहासाची साधनं अभ्यासायला सुरूवात केली होती. त्याचबरोबर आर्कियॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया च्या डी. आर. भांडारकर, हेन्री कझिन्स अशा अधिकार्यांनीही महाराष्ट्रातील (तेव्हाची बॉम्बे प्रेसिडेन्सी) पुराणवस्तू-अवशेषांचा अभ्यास करण्याचे काम हाती घेतले होते. पण तत्कालीन राजकीय पार्श्वभूमीमुळे जीवन झोकून देऊन स्वखर्चाने काम करणारे राष्ट्रवादी (nationalist) इतिहासकार आणि तितक्याच तळमळीने पण सरकारी संस्थांबरोबर/ त्यांच्या सहाय्याने काम करणारे इंडॉलॉजिस्ट्स आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ यांच्यात कायमच एक दरी राहिली. दुर्दैवाने दोघांनीही एकमेकांच्या कामाची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्यातच राष्ट्रवादी मराठीत लिहिणार तर सरकारी अहवाल आणि अमराठी लोकांनी केलेले संशोधन इंग्लिशमधे हा मुद्दा होताच. शिवाय बहुतेक राष्ट्रवादी इतिहासकारांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू स्वाभाविकपणे शिवकाळ / मराठा काळ होता तर प्राचीन इतिहास व संबंधित शिलालेख, नाणी, मंदिरे - लेण्या, उत्खनने हे सगळं बर्यापैकी सरकारी अखत्यारीत होतं - ज्याला आपण colonial Indology and archaeology असं म्हणतो.
१९४०-४५ पर्यंत महाराष्ट्रात अगदीच तुरळक उत्खनने झाली. उदा: निझाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने केलेले पैठण येथील व भारत इतिहास मंडळाने केलेले कराड येथील उत्खनन.. पण त्यात मिळालेले पुरावे अगदीच मर्यादित होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या रूपरेखेत फारसा बदल झाला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनाला महाराष्ट्रात चांगलाच वेग आला आणि या प्रदेशात मनुष्यवस्ती कधीपासून झाली आणि त्यात कसे आणि कोणते बदल होत गेले याचे एक बर्यापैकी सुसंगत चित्र आपल्यासमोर उभे राहिले.
अजूनही नित्य नूतन संशोधन होतच आहे. आज आपण इथे जी माहिती वाचणार आहोत ती बहुतांशी या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक साधने आणि संशोधनावर आधारित आहे.
काय असतात ही साधने? हे पुरातत्त्वीय पुरावे?
आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पुरातत्त्वशास्त्रज्ञ भूभागाचे सर्वेक्षण करून जुन्या मानवी वस्तींची ठिकाणे शोधून काढतात आणि त्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उत्खनन करून त्या वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतात. सर्वसामान्यपणे उत्खननात मिळणारे अवशेष म्हणजे घरांच्या जमिनी/ plans, खापरांचे तुकडे, हाडे, दगडाची व धातूची औजारे व हत्यारे, दफने, धान्याचे जळालेले दाणे, मणी, राख, माती, इ,. या सगळ्याचे परीक्षण करून विविध निष्कर्ष काढले जातात व शक्य असेल तिथे कालमापन पध्द्ती वापरून या अवशेषांचे वयोमान ठरवतात. इतिहासपूर्व काळात, लिखित स्वरूपाचे कुठलेही पुरावे नसताना, फक्त याच पुराव्यांचे दुवे जुळवत आपल्याला पुढे जायला लागते.
एकदा ऐतिहासिक कालखंडात आलं की या सगळ्या गोष्टींबरोबरच शिलालेख, ताम्रपट, नाणी, ग्रांथिक पुरावे, वास्तुकला, ही साधनेही मदतीला येतात. आणि या सगळ्याचा साकल्याने अभ्यास करून आपल्याला इतिहास लिहिता येतो.
१९४७ पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास फक्त दोन हजार वर्षे मागे नेता येत होता. सातवाहन राजांचे शिलालेख, नाणी, तत्कालीन लेणी इ. पुराव्यावरून हे महाराष्ट्रातलं पहिलं राजकुल असावं असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. पण त्याआधी इथे कुणाची वसाहत होती? किती आधीपासून होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. मग त्या स्पष्टीकरणासाठी पुराणांतरी उल्लेख आलेल्या शक, नाग, हूण अशा वेगवेगळ्या कुलांच्या स्थलांतरांमधे धांडोळा घेतला जात होता (पहा :- राजवाडे, केतकर, भागवत, इ. इ.). हे सगळं चित्र अचानक बदललं. कसं? त्याचीही कहाणी तितकीच रंजक आहे..
कार्बन १४ पद्धती :
पुरातत्त्वीय पुराव्यांचे कालमापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. ही पद्धत एफ. डब्ल्यू. लिबी यांनी १९४९ साली शोधून काढली व १९६० साली परिपूर्ण केली. या कामाबद्दल त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
प्रत्येक सजीव (मानव, वनस्पती, प्राणी) जिवंत असेपर्यंत कार्बन-डायऑक्साईडद्वारे कार्बन १४ शरीरात घेत असतो. सर्व सजीवांमध्ये सी-१४ चे प्रमाण एकच असते व मृत्यूनंतर सर्व सजीवांच्या अवशेषातून सी-१४ एकाच प्रमाणात बाहेर पडते. जिवंतपणी असलेल्या सी-१४ चा अर्धा भाग मृत्यूनंतर ५५६८ वर्षांनंतर नाहीसा होतो. या कालावधीला सी-१४ चे अर्धे आयुष्य म्हणतात.
या पद्धतीनुसार आधुनिक काळातील कार्बनच्या किरणोत्सर्जनाशी मृत प्राण्याच्या किरणोत्सर्जनाची तुलना केली असता प्राण्याचा मृत्यू केव्हा झाला हे ठरवता येते.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर या नागरीकरणाच्या प्रवासाच्या दिशेने सुरुवात सुमारे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी झाली. इथल्या अतिप्राचीन मानवी वसाहतीचे तीन कालखंड पडतात. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग आणि लोहयुग. इथल्या माणसांनी, त्यांना मराठी म्हणता येणार नाही कारण मराठी ही आपली ओळख जेमतेम बाराशे-तेराशे वर्षे जुनी आहे. आद्य अश्मयुगात म्हणजे साधारण दोन लाख वर्षांपूर्वी तयार केलेल्या दगडी हत्यारांचे अवशेष गोदावरी, प्रवरा, मुळा-मुठा, तापी, पूर्णा, वर्धा इत्यादी अनेक नद्यांच्या काठी सापडले आहेत. इ.स.पूर्व ८००० ते ९००० च्या दरम्यान जगात कोणताही धर्म आणि संस्कृती नांदत नव्हती. मनुष्य शिकार गोळा करण्याच्या अवस्थेतून बाहेर येऊन हळूहळू शेती करू लागला होता. शेतीचं महत्त्व त्याच्या ध्यानात येत होतं.
माणसाने शिकार कमी करून शेतीकडे लक्ष वळवल्यावर, शेतीचे पूर्ण फायदे लक्षात येण्यास आणि शिकार्यापासून शेतकर्यापर्यंत त्याचा प्रवास होण्यास शेकडो आणि हजारो वर्षांचा कालावधी गेला आहे. हे लक्षात घ्यायला हवे की हा अश्मयुगाचा काळ आहे. माणसाकडे धातूची शस्त्रे नाहीत, नव्हती. या काळात धर्म, संस्कृती इ. सोडाच पण शेतीशिवाय इतर उद्योगही करायचेही माणसाला माहित नव्हते. इ.स.पूर्व ८-९००० वर्षांपूर्वी माणूस हळू हळू गावे बांधून राहायला लागला होता. जे काही धर्म म्हणून तो पाळत होता तो "शॅमॅनिजम" (याला मराठी शब्द माहित नाही.) प्रकारचा होता. माणसाला समाज आणि समाजरचनेची जाणीव हळूहळू होऊ लागली होती. साधारणपणे इतिहासाची विभागणी प्रागैतिहास, इतिहासपूर्व व ऐतिहासिक कालखंड अशा तीन भागात केली जाते.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्खननाद्वारे सापडलेल्या हत्यारांच्या आधारे अश्मयुगाची तीन कालखंडात विभागणी केली जाते. १ पुराश्मयुग (इ. स. पू. ३ लाख ते इ. स. पू. ८०००) २ मध्याश्मयुग (इ. स. पू. ८००० ते इ. स. पू. ४०००) ३ नवाश्मयुग (इ. स. पू. ४००० ते इ. स. पू. १०००)
प्रागैतिहास -
ज्या काळात मानवास लिपी अवगत नव्हती व मानवी जीवन हे रानटी व भटक्या स्वरूपाचे होते. या कालखंडाला प्रागैतिहास असे म्हणतात. यानुसार अश्मयुगाचा समावेश प्रागैतिहास काळात केला जातो इतिहासपूर्व - ज्या काळातील मानवाचे जीवन प्रागैतिहासिक मानवापेक्षा प्रगत होते व या मानवाला लिपी अवगत होती; परंतु ती अस्पष्ट किंवा गूढ असल्याने तिचे वाचन करता आले नाही. या कालखंडाला इतिहास पूर्व काळ असे म्हणतात. सिंधू संस्कृतीची गणना इतिहास पूर्वकाळात केली जाते. ऐतिहासिक कालखंड - ज्या काळात मानवाचे जीवन सुसंस्कृत बनले व ज्या काळात लिखित ऐतिहासिक पुरावे प्राप्त होतात, त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात. यानुसार इ. स. पू. ६ व्या शतकापासूनच्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे मानले जाते.
अश्मयुग (Stone Age) :
मानवाच्या भौतिक विकासामध्ये अश्म म्हणजेच दगडाचे खूप महत्त्व आहे. प्रारंभी मानवाने दगडाचा उपयोग करून अन्न संग्रहित केले, दगडाचा उपयोग करून निवारा बनवला, दगडावरच कलेचे आविष्कार केले व अग्नीची ही उत्पत्ती दगडाद्वारेच केली. प्रारंभिक मानवाने आपली अवजारे, हत्यारे व निवारा यासाठी दगडांचा वापर केल्याने या कालखंडाला ‘अश्मयुग' असे म्हणतात. मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड. हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात.
अश्मयुग, भारतातील: भारतात आजतागायत झालेले उत्खनन व संशोधन अश्मयुगातील कोणत्याच अवस्थेतील मानवाच्या जीविताचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे करू शकत नाही. त्यातल्या त्यात नवाश्मयुगीन जीवनाविषयी थोडीशी तरी माहिती हाती येते पण इतर युगांतील मानव, त्याची वस्ती, त्याच्या भोवतालची सृष्टी, यांच्याविषयी जी कल्पना येते, ती फारच अंधुक व अस्पष्ट आहे. याचे साधे कारण असे, की अश्मयुगीन मानवाच्या जीवनावर प्रकाश पाडणारे जे अवशेष मिळाले आहेत, ते तुरळक व फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांवरून त्याची जीवनपद्धती लक्षात येऊ शकत नाही व एकूण जागतिक अश्मयुगीन मानवी संस्कृतीशी असणारे त्याचे नातेही उलगडू शकत नाही. जे काही निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत, ते फक्त दगडी आयुधे व उपकरणे यांच्या वर्गीकरणांतूनच. निरनिराळ्या वर्गांची यूरोपीय व आफ्रिकी वर्गांशी तुलना करून सांस्कृतिक टप्पे व कालक्रम यांविषयी विवेचन करण्यात आलेले आहे. या अवस्थांचा भूस्तरीय घडामोडींशीही कसा संबंध लावता येईल, या प्रश्नाचाही नीट निर्णय लागलेला नाही. या मर्यादा ध्यानात ठेवूनच भारतातील अश्मयुगासंबंधीच्या माहितीची नोंद घेतली जावी. भारतीय अश्मयुगाचे चार खंड पाडण्यात येतात–पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग (कार्बन कालनिर्णयानुसार हा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता सिद्ध झाले आहे), उत्तराश्मयुग, आणि नवाश्मयुग यांतील नवाश्मयुगीन जीवनाचे स्वरूप जगाच्या इतर भागातील नवाश्मयुगातल्यासारखेच आहे. त्यापूर्वीच्या तीन कालखंडांतील सांस्कृतिक स्थिती, तदर्थक यूरोपीय संज्ञांत जे अभिप्रेत आहे तशी दिसत नाही. त्या अर्थाने उत्तरपुराणाश्मयुगाचा तर भारतात आढळही होत नाही. परंतु सांस्कृतिक अवस्था स्पष्ट करण्याच्या दृष्टीने सामान्यपणे भारतातील पूर्वाश्मयुग = यूरोपातील पूर्वपुराणाश्मयुग भारतातील मध्याश्मयुग = यूरोपातील मध्यपुराणाश्मयुग आणि भारतातील उत्तराश्मयुग = यूरोपातील उत्तरपुराणाश्मयुग अशी समीकरणे मांडता येतील.
प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले जाते. यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.
प्रागैतिहासिक काळाचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात लेखनकला, स्थिर जीवन,
धातूंचा वापर, योजनाबद्ध वसाहत वा अन्नोत्पादन यांचा पूर्णत: अभाव आढळतो.
हा कालखंड सर्वांत मोठा असून त्याचा अभ्यास उत्खनित पुराव्यांद्वारे करावा
लागतो. आद्य इतिहास कालखंडाचे लिखित पुरावे उपलब्ध असतात; परंतु त्यांचा
उलगडा करता आलेला नाही, मात्र तत्संबंधी लिहिले गेले आहे. तर इतिहासकाळाचे
लिखित पुरावे उपलब्ध असतात व ते वाचून त्याची उकल करणे शक्य असते. म्हणूनच
इतिहासकाळाच्या पूर्वीचा काळ हा सर्वसाधारणपणे प्रागैतिहासिक काळ म्हणून
ओळखला जातो. या तीनही संज्ञा काहीशा कृत्रिम आहेत. त्यांत प्रदेशपरत्वे फरक
आढळतो. कारण त्या कालबद्ध वा प्रदेशनिबद्ध नाहीत. आजही पाषाणयुगीन जीवन
जगणाऱ्या काही जमाती अस्तित्वात आहेत.
प्रागैतिहासिक कलेचे नमुने पुढील माध्यमांत विशेषत: आढळतात.
(१)
गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावर काढलेली चित्रे;
(२)
गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावरील उत्कीर्णन;
(३)
प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती;
(४) अपोत्थित शिल्पे;
(५) दगड, हाडे वा
शिंगे यांसारख्या वस्तूंवर केलेली चित्रकारी अथवा उत्कीर्णन.
अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.
अश्मयुगीन हत्यारे व साधने
भारतामध्ये इ. स. १८६३ मध्ये रॉबर्ट ब्रुस फुट या भूतत्त्व विद्वानाला मद्रास जवळील पल्लवरम येथे सर्वप्रथम पुराश्मयुगीन पाषाणोपकरण मिळाल्यावरच अश्मयुगीन काळातही भारतात लोकवस्ती असल्याचे निश्चित झाले.महाराष्ट्र हा ‘कणखर देशा, दगडांच्या देशा’ असाच ओळखला जातो. महाराष्ट्राच्या भूतकाळातील पहिले पान म्हणजे अश्मयुग (पाषाणयुग).अश्मयुग या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. अश्मयुग (stone age) म्हणजेच मानवाच्याविकासाचा प्रथमाध्याय होय ! या काळातील माणूस भटक्या अवस्थेत होता. नदी हीच त्याची जीवनदायिनी. नदीकाठी वास्तव्य करुन आपल्या आजुबाजुला उपलब्ध असलेल्या दगडांपासून तो हत्यारे तयार करीत असे. महाराष्ट्रातील बोरी येथे काही अश्मयुगीन हत्यारे टेफ्रा (ज्वालामुखीची राख) वर मिळाली होती. वैज्ञानिक तपासानुसार ही राख १.४ दशलक्ष वर्षांपूर्वीची असल्याने तिथे सापडलेल्या या वस्तू अश्मयुगीन काळातील असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर तांबे या धातुचा शोध लागला. या कालावधीला पुरातत्त्व शास्त्रज्ञ ताम्रपाषाणयुग असे संबोधतात. महाराष्ट्रातील दायमाबाद, सावळदा, इनामगाव व अश्या अनेक ठिकाणी उत्खननात तांबे व त्याबरोबरच त्या काळात वापरली जाणारी मातीची खापरे आणि इतर काही वस्तू व वास्तु संशोधकांना मिळाल्या. याचबरोबरीने शेतीसंस्कृतीचा उदय ही महाराष्ट्रात झाला होता. मुळातच अनेक नद्यांमुळे ही भूमी सुपीक आहे. त्यामुळे इथल्या नद्यांच्या प्रदेशात हा माणूस शेतीसाठी स्थिरावला.पुढे ‘लोखंड’ या धातूशी मानवाची ओळख झाली. साधारणतः हा काळ इ.स. पूर्व १२०० पासून सुरु झाला असं म्हणतात. ‘लोह’ हा माणसाच्या आयुष्यातला एक अतिशय महत्त्वाचा असा शोध ठरला. महाराष्ट्रातील विदर्भ भागात जमीनी खाली लोखंडाची काही हत्यारे, व इतर वस्तू संशोधकांना सापडल्या. त्याच बरोबर नायकुंड ह्या नागपुर जवळ असलेल्या गावात लोखंडाची काही हत्यारे व चिकणमातीपासून बनवलेली लोह भट्टी मिळाली.त्याचबरोबर संशोधकांना ‘megalithic burial ‘ (प्राचीन काळी काही जमातींमध्ये माणूस मृत्यू पावल्यावर त्याला ज्या जागी पुरले जायचे तेथे मोठे मोठेदगड रचून ठेवले जायचे) चे काही अवशेष ही मिळाले. त्याच प्रमाणे माहुर्झरी, जूनापाणी,इत्यादी ठिकाणी बरेच महत्त्वाचे शोध लागले. अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये
स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक
आहेत.
अश्मयुग आणि मानव उत्क्रांती Marathi
~3 minutes
अश्मयुग हा मानवी इतिहासातील अतिप्राचीन कालखंड होय हा सु. पाच लाख ते दहा हजार वर्षापूर्वीपर्यंत साधारणत: मानण्यात येतो. सर्वसाधारणपणे माणसाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या इतिहासास प्रागितिहास म्हणतात. प्रागैतिहासिक काळापैकी एका सांस्कृतिक अवस्थेस, म्हणजे जेव्हा प्रामुख्याने दगडाचाच उपयोग हत्यारांसाठी केला जात होता त्या काळास ‘अश्मयुग’ असे म्हटले जाते.
यात मानवास कोणताही धातू व धातूचा जाणीवपूर्वक उपयोग माहीत नव्हता. प्रागितिहासाचा जवळजवळ चारपंचमांश भाग अश्मयुगानेच व्यापला आहे. अश्मयुगातील मानव त्याच्या भोवती असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड इत्यादींचा उपकरणे व हत्यारे बनविण्यासाठी उपयोग करीत होता. त्यांपैकी लाकूड व हाडे सहज नाश पावणारी असल्याने या पदार्थांची आयुधे वा उपकरणे मानवी वस्त्यांच्या अवशेषांत सहसा आढळत नाहीत. मात्र दगड टिकाऊ असल्याने त्याची उपकरणे व आयुधे पुष्कळ सापडतात. यावरूनच या कालखंडास ‘अश्मयुग’ असे नाव देण्यात येते.
अश्मयुगातील माणूस सर्वत्र एकाच प्रकारची आयुधे वापरीत होता किंवा एकाच पद्धतीचे जीवन व्यतीत करीत होता असे समजणे चुकीचे ठरेल. स्थलकालपरत्वे वेग व दिशा भिन्न असल्या तरी त्याच्या जीवनात प्रगती निश्चितच होती. ही मानवी प्रगती दर्शविण्यासाठी अश्मयुगाचे पुराणाश्मयुग, मध्याश्मयुग किंवा आंतराश्मयुग आणि नवाश्मयुग असे तीन मुख्य टप्पे कल्पिण्यात आले आहेत. त्यांतही पुराणाश्मयुगाचे पूर्व- पुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आणि उत्तरपुराणाश्मयुग असे पुन्हा तीन उपविभाग पाडले आहेत. या सर्व संज्ञा मुख्यतः यूरोपातील संशोधनांतून उत्पन्न झाल्या. इतर खंडांत प्रागैतिहासिक संशोधनाचा विकास सुरू झाल्यावर असे दिसू लागले, की तेथील प्रगतीची स्तबके काहीशी भिन्न असून वरील संज्ञा त्यांना चपखलपणे लागू पडत नाहीत. नवाश्मयुगापूर्वी पूर्व, मध्य व उत्तर अशी तीनच अश्मयुगे कल्पावी असे आफ्रिका, अमेरिका व भारत येथील काही पुरातत्त्वज्ञ समजत. परंतु स्थलविशेषामुळे उत्पन्न झालेल्या पारिभाषिक संज्ञांचा आशय अद्यापही निश्चित झालेला नाही. म्हणून सर्वत्र यूरोपीय संज्ञाच वापरण्यात आल्या आहेत.अश्मयुगाच्या उपर्युक्त विभागांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये स्थूलमानाने पुढीलप्रमाणे होत. यांच्या कालमर्यादांत स्थलभेदानुसार फरक आहेत.
आद्याश्मयुग (सु. पाच लाख वर्षांपूर्वीचे)
पूर्वपुराणाश्मयुग (सु. पाच लाख ते दीड लाख वर्षे)
मध्यपुराणाश्मयुग (सु. पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षे)
उत्तरपुराणाश्मयुग (सु. पंचवीस हजार ते दहा हजार वर्षे)
आंतराश्मयुग (सु. पंधरा हजार ते दहा हजार वर्षे)
नवाश्मयुग (इ. स. पू. सु. आठ हजार वर्षांपासून )
अश्मयुगीन कालखंड
पूर्वपुराणाश्मयुग :(Palaeolithic Age)
याचा काळ
सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही
भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती.
या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या
(तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो.
अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार
बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले.
वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत
राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे
भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे,
घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या
प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते. वंशशास्त्रदृष्ट्या
ज्याचा उल्लेख करता येणार नाही, पण तत्सदृश असे ऑस्ट्रेलोपिथेकस
(Australopithecus), पिथेकॅन्थ्रापस (Pithecanthropus) व निअँडरथल
(Neanderthal) हे मानवसदृश प्राणी पृथ्वीवर वावरत होते. पण त्यांचा वावर
भूपृष्ठाच्या एकपंचमांश क्षेत्रापुरताच मर्यादित होता. अमेरिका व
ऑस्ट्रेलिया या खंडांत जवळजवळ वस्ती नव्हतीच. सांस्कृतिक दृष्ट्या या
माणसांचे पाच गट पाडण्यात येतात. ते असे : व्हिलाफ्रांकिअन
(Villafranchian)–पहिल्या हिमयुगाच्या पहिल्या चरणात अबेव्हिलिअन
(Abbevillian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या पहिल्या चरणात क्लॅक्टोनियन
(Clactonian)–पहिल्या आंतरहिमयुगाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चरणांत अश्यूलियन
(Acheulian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या प्रथमार्धात व लेव्हालेइशियन
(Levalloisian)–दुसऱ्या आंतरहिमयुगाच्या उत्तरार्धापासून पुढे.
तंत्रविशेषां- वरून समजांचे वरील गट पाडण्यात आले आहेत. त्यामध्ये वांशिक
भेद अभिप्रेत नाहीत.
प्रत्येक कालखंडात दगडी हत्यारे बनविण्याच्या तंत्रपद्धती आणि हत्यारांचे प्रकार भिन्न आहेत. पूर्व आफ्रिकेतील इथिओपियातील अफार त्रिकोणीय प्रदेश, टांझानियातील ओल्डोवाय गॉर्जमध्ये (घळई) आणि दक्षिण अफ्रिकेतील अनेक अतिप्राचीन गुहांमध्ये मानवी उत्क्रांती दर्शविणारे विविध पुरामानवाचे अश्मीभूत सांगाडे /अवशेष आणि आद्यपुराश्मयुगीन दगडी हत्यारे मोठ्या प्रमाणात सापडली आहेत. यामुळे आफ्रिका खंड हे मानवाची उत्क्रांती आणि अश्मयुगीन संस्कृतीचे उगमस्थान आहे, असे मानले जाते.
पूर्वपुराणाश्मयुगातील दगडी आयुधांत प्रामुख्याने तीन
तंत्रे वा तंत्रप्रकार दिसतात. पहिला हातकुऱ्हाडीचा असून त्यात गोट्याच्या
दोन्ही बाजूंचे टवके उडवून हत्यारे करण्यात येत. यांत बदामी आकाराचे टोकदार
हत्यार हे प्रमुख होते. यावरूनच त्यास हातकुऱ्हाडतंत्र हे नाव पडले. दुसरा
प्रकार म्हणजे कोयत्यासारखे किंवा खाटकाच्या सुऱ्या- सारखे तुकडे तोडणारे
दगड व तत्सम हत्यारे निर्माण करण्याचे तंत्र होय आणि तिसरा प्रकार दगडी
छिलक्यांपासून वरील दोन्ही प्रकारची उपकरणे तयार करणे हा होता. पहिल्या
प्रकारचे तंत्र यूरोप, आफ्रिका, पश्चिम आशिया येथे, तर दुसरे तंत्र चीन व
आग्नेय आशिया यांत आढळते आणि तिसरे तंत्र प्रथम पॅलेस्टाइन व पुढे वायव्य
भारतात दिसते. कालांतराने ते इतरत्रही पसरले.
आफ्रिका खंडात आद्य-पुराश्मयुगात, आदिमानवाने दगडी हत्यारे बनविण्यासाठी दोन पद्धतींचा अवलंब केलेला आढळून येतो. यातील सर्वांत प्राचीन पद्धतीमध्ये प्रामुख्याने गोटा परंपरेतील दगडी हत्यारे बनविण्याचे तंत्र विकसित केले गेले. या पद्धतीला ओल्डॊवान परंपरा (Oldowan Tradition) असे संबोधण्यात येते. या परंपरेची सुरुवात साधारणतः २६ लाख वर्षांपूर्वी झाली होती. इथिओपियातील अफार त्रिकोणीय प्रदेशातील खचदरीत (African Rift Valley) गोना (Gona) आणि लेडी गेरारू (Lady Geraru) येथे आजमितीला जगातील सर्वांत जुनी म्हणजेच २५ ते २६ लाख वर्षांर्पूर्वीची ओल्डॊवान परंपरेची दगडी हत्यारे मिळालेली आहेत. या शिवाय हत्यारांबरोबर आर्डीपिथेकस आणि होमो इरेक्टसचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत. ओल्डॊवान परंपरेची हत्यारे होमो हॅबिलिस या मानवाने तयार केली होती. जॉर्जिया (यूरेशिया) मधील दमानिसी (Dmanisi) येथील उत्खननात मिळालेल्या पुरामानवाच्या अश्मीभूत कवट्या आणि त्यासोबत दगडी हत्यारांचे कालमापन १८ लाख वर्षपूर्व आहे. ही दगडी हत्यारे ओल्डॊवान किंवा त्या आधीची असावीत. या नवीन संशोधनावरून असे दिसते की, आफ्रिकेत होमो इरेक्ट्स प्रजाती अस्तित्वात येण्यापूर्वी पुरामानवाने यूरेशियात पाऊल ठेवले होते. कालानुक्रमे १७ लाख वर्षांपूर्वी दुसरे तंत्र विकसित झाले. छिलका हत्यारांचा समावेश असलेल्या या परंपरेला ॲश्युलियन संबोधले जाते. ॲश्युलियन संस्कृतीमध्ये (लार्ज फ्लेक ॲश्युलियन) १० सेंमी. पेक्षा मोठ्या छिलक्यांपासून हत्यारे तयार करत असत. ही पद्धत ओल्डॊवान परंपरेपेक्षा वेगळी आहे. मोठे छिलके हे मोठ्या दगडापासून तोडून वेगळे करत असत. दगडी हत्यारे मोठ्या आकाराच्या छिलक्यापासून अथवा गोट्यापासून अथवा छिलके काढलेल्या मोठ्या गाभ्यापासून बनविली जात. सुरुवातीच्या काळातील हत्यारे अगदी ओबडधोबड आणि वेड्यावाकड्या आकाराची आढळून येतात. कालांतराने पुरामानव उत्कृष्ट धारदार हत्यारे बनवू लागला. हत्यारे बनविताना मोठे व खोलगट छिलके अथवा चिपा काढण्याऐवजी लहान व पातळ चिपा काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे हत्यारे ओबडधोबड न होता सुबक, प्रमाणबद्ध व धारदार कडा असलेली होऊ लागली. मोठ्या छिलक्यांपासून बनवलेल्या हत्यारांमध्ये हातकुऱ्हाड (Handaxe), फरशी (Cleaver), तोडहत्यारे (Chopper), तासण्या (Scraper) इत्यादींचा समावेश होतो. आद्य-पुराश्मयुगीन ॲश्युलिअन संस्कृतीचा विस्तार हा आफ्रिका, यूरोप आणि आशिया खंडात झालेला होता. इतर खंडांमध्ये आपल्याला ॲश्युलिअन संस्कृतीचे अवशेष आढळून येत नाहीत. अश्युलिअन परंपरेची हत्यारे मोठ्या प्रमाणात होमो इरेक्टसने बनविली. आफ्रिका खंडात केनियातील कोकिसेली (Kokiselei), टांझानियातील ओल्डोवाय गॉर्ज आणि इथिओपियातील गोना व कॉन्सो (Konso) येथे मिळालेली अश्युलिअन परंपरेची हत्यारे १७ लाख वर्षांपूर्वीची आहेत. यूरोप खंडात स्पेनमधील सोलाना डेल झाम्बोरीनो (Solana del Zamborino) व एस्टरेको डेल क्वीपार (Estrecho del Quipar) या दोन गुहांमध्ये ९ लाख वर्षपूर्व काळातील ॲश्युलिअन परंपरेची दगडी हत्यारे मिळाली आहेत. आशिया खंडात ॲश्युलियन संस्कृतीच्या पाऊलखुणा भारतातील अतिरमपक्कम (तमिळनाडू) येथे १५ लाख वर्षांपासून अस्तित्वात आहेत, तर कर्नाटकातील इसामपूर येथे १२ लाख वर्षेपूर्व काळात त्या दिसतात. महाराष्ट्रात गोदावरीच्या खोऱ्यामध्ये चिरकी ऑन प्रवरा आणि लक्ष्मी नाला, नेवासा ही स्थळे साधारणपणे ८-१० लाख वर्षे (आद्य प्लाइस्टोसीन) जुनी आहेत आणि भीमा खोऱ्यात मोरगाव आणि बोरी ही स्थळे ८ लाख वर्षांपूर्वीची आहेत. चीनमध्ये ॲश्युलियन परंपरेची दगडी हत्यारे ८ ते ९ लाख वर्षपूर्व या काळातील आहेत. ॲश्युलिअन संस्कृती ही १७ लाख वर्षपूर्व ते सव्वा लाख वर्षांपर्यत अस्तिवात होती. ही संस्कृती अस्तिवात असतानाच साधरणपणे साडेतीन लाख वर्षांपूर्वी मध्य पुराश्मयुगीन परंपरेची दगडी हत्यारे असणारी संस्कृतीची सुरुवात झाली.
पूर्वाश्मयुगातील आयुधांचे दोन स्पष्ट गट पडतात. एक गट वायव्य भारत व काश्मीर या भागापुरता असून, दुसरा भारताचा इतर प्रदेश, मुख्यत: आंध्र-तमिळनाडू इ. भागांत पसरला आहे. पहिल्या गटातील हत्यारे गोटे व मोठाली छिलके यांची बनविलेली आहेत. गोलसर बाजू पंजात पकडून खालच्या, सरळ धारेच्या बाजूने वस्तूंचे तुकडे पाडणे, हे या हत्यारांचे मुख्य काम होते. त्यांना चॉपर म्हणतात. पहिल्या गटात असे चॉपर व तत्सम प्रकार आढळतात. दुसऱ्या गटात, मुख्यत्वे छिलके व कपच्या दोन्ही बाजूंनी घडवून तयार केलेली बदामी आकाराची हातकुऱ्हाड हे मुख्य आयुध आहे. हे दोन्ही गट भौगोलिक दृष्ट्या अलग असले, तरी कालदृष्ट्या निकट आहेत–प्राय: समकालीनच असावेत. द्वितीय हिमयुगाच्या शेवटापासून येथे दोन्ही प्रकारची हत्यारे घडविण्यात आली. तृतीय हिमयुगात या संस्कृतीचा विस्तार व तंत्रज्ञान यांचा परमोत्कर्ष झाला पण या युगातील मानवाच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत. कोकणपट्टीसारखे एका बाजूचे प्रदेश सोडले, तर भारताच्या बहुतेक सर्व भागांत मध्याश्मयुगीन आयुधे मिळाली आहेत. ही आयुधे चर्ट, जास्पर अशांसारख्या टणक व एकसंध दगडांपासून बनविलेली असून पूर्वाश्मयुगीन आयुधांपेक्षा खूपच लहान आहेत. यांत हरतऱ्हेच्या तासण्या, भोके पाडण्यास उपयुक्त अशी चोच असणारी हत्यारे बऱ्याच संख्येने सापडतात. कातडी कापण्यास व शिवण्यास त्यांचा उपयोग होत असावा. त्यांबरोबर छोट्या हातकुऱ्हाडीही आढळतात. वरील दगडांची छिलके व क्वचित पातीही दिसतात. मध्य-अभिनूतन काळाच्या शेवटच्या सहस्त्रकांपासून तो नूतनतम काळाच्या आरंभापर्यंत या युगाचे अस्तित्व होते. या काळी हवामान फारसे आर्द्र नसून घनदाट अशी जंगलेही फारशी पसरली नव्हती. या वेळच्या मानवाच्या शरीराचे अवशेष उपलब्ध नाहीत. आतापर्यंत रानटी बैल व भीमगज यांची हाडे सापडली आहेत.
पुराश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :- १)पुराश्मयुगीन मानवी जीवन हे भटक्या स्वरूपाचे होते.
२)या काळातील मानव उन, थंडी, पाऊस, हिंस्र राणी इ.पासून संरक्षणासाठी नैसर्गिक गुहा व मोठ्या शिळांचा आश्रय घेत असे.
३) या काळातील मानव कच्चे मांस व कंदमुळे खात असे.
४) पुराश्मयुगीन मानव झाडांच्या साली व प्राण्यांच्या कातड्यांनी आपले शरीर झाकत असे.
५)या काळातील मानवाचे शारीरिक अवशेष उत्खननातून मिळाले नाहीत
६)पुराश्मयुगीन मानव शिकारीसाठी ओबडधोबड व आकाराने मोठ्या दगडांचा वापर करत असे.
७)या काळातील हत्यारे बेसाल्ट व डोलेराईट या खडकापासून बनवलेली असत. नंदूरबार जिल्ह्यातील कुंभारपाडा व उमरज, धुळे जिल्ह्यातील भाडणे, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथून पुराश्मयुगीन अवशेष प्राप्त होतात.
८) उत्खननात सापडलेल्या हत्यारांमध्ये हातकु-हाडी, तासण्या, वेधण्या यांचा समावेश होतो.
पूर्वपुराणाश्मयुगाची इतकी सविस्तर माहिती घेतल्यावर या काळातील महाराष्ट्रातील पुरातत्व स्थळांची माहिती घेउया.
बोरीची टेफ्रा :-
कुकडी नदीच्या तीरावर वसलेल्या बोरी गावात, इंडोनेशियातील
सुमात्रा बेटावर ७५,००० वर्षांपूर्वी जागृत झालेल्या "टोबा" ज्वालामुखीतून
बाहेर पडलेली राख (tephra Ash) पाहायला मिळते . बोरी आणि टोबा मधले अंतर
अंदाजे ३००० किलोमीटर आहे. जगात हाताच्या बोटांवर मोजता येण्या इतके
महाज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहेत. महाज्वालामुखींचा उद्रेक साधारणतः
लक्षावधी वर्षांतून एकदा होतो. इतिहासातील शेवटचा मोठा महाज्वालामुखी
उद्रेक हा टोबा (Toba), इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर सुमारे ७५,०००
वर्षांपूर्वी झाला होता . त्याला Young Toba Tuff (YTT) म्हणतात.
त्यापूर्वी ८ लाख वर्षापूर्वी टोबा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता . त्याला
Oldest Toba Tuff(OTT) म्हणतात. या महाउद्रेकाचा जोर इतका प्रचंड होता, की
अख्खा टोबा पर्वतच कोसळून तेथे प्रचंड मोठे विवर तयार झाले. कालांतराने
त्यात पाणी भरून तळे तयार झाले. हेच आता "लेक टोबा" या नावाने ओळखले जाते.
टोबा कॅटेस्ट्रॉफी थिअरी (Toba Catastrophe Theory) नुसार या उद्रेकामुळे
इतक्या मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडली, की उद्रेकानंतर ६ ते १० वर्षे
सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे हिमयुग आले. त्याचा
परिणाम पुढील शेकडो वर्षे राहिला. अशा प्रकारच्या हिमयुगाला ज्वालामुखीय
हिमयुग (Volcanic Ice Age) म्हणतात. टोबा ज्वालामुखीच्या उद्रेका नंतर
त्याची राख आशिया, अफ्रिका आणि युरोप मध्ये पसरली. आपल्या महाराष्ट्रात ही
राख आजही दोन ठिकाणी पाहाता येते. १) अहमदनगर जिल्ह्यातील "बोरी" या गावी
कुकडी नदीच्या तीरावर आणि २) पुणे जिल्ह्यात अष्टविनायका पैकी "मोरगाव" जवळ
कर्हा नदीच्या तीरावर पाहायला मिळते. या दोन्ही ठिकाणी एकाच ज्वालामुखीची
राख असली तरी ती वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला मिळते.
बोरी येथील ज्वालामुखीतील राख किंवा टेफ्रा
बोरी
गावातून कुकडी नदीवरील पूल पार केल्याबर नदीच्या कडेने एक छोटा रस्ता जात
होता. रस्त्याच्या एका बाजूला ऊसाची शेती आणि दुसर्या बाजूला नदीच पात्र
दिसत होते. एका शेतकर्याच्या घरा जवळून पाऊल वाटेने नदी काठचा उतार उतरून,
नदी पात्रा लगत २ ते ३ मिनिटे चालल्यावर "टेफ्रा ॲशचे" (Tephra Ash)
पिवळ्या मातकट रंगाचे चूनखडीच्या दगडासारखे काही पट्टे पाहायला मिळतात.
टोबा ज्वालामुखीची राखेचे पट्टे नदीपात्रापासून पाच ते दहा मीटर आत आहेत.
याठिकाणी साधारणपणे २० सेंटीमीटर ते ३ मीटर जाडीचे राखेचे थर विखुरलेले
आहेत. ही राख चुन्याच्या दगडा सारखी घट्ट झालेली असून, तीचा रंग मातकट
पिवळा झालेला आहे. नदी पात्रातल्या वाळूतील घटकांशी वर्षानुवर्ष रासायनिक
प्रतिक्रिया (Chemical reaction) झाल्यामुळे टोबा ज्वालामुखीची राख इथे मुळ
स्वरुपात आढळत नाही.
या ठिकाणी एक निळ्या रंगाचा फ़लक
लावून त्यावर राखे संबंधी थोडीशी माहिती लिहिलेली आहे. नदी काठ असल्याने
या ठिकाणी भरपूर झाडं झूडपं उगवलेली आहेत. त्यातच राखेचे अवशेष आहेत.
कुकडी नदीच्या काठावर ही राख पूर्वी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होती, पण वाळू
उपस्यामुळे ही राख मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली. इसवीसन २०१६ मध्ये
हायकोर्टाने वाळू उपश्यावर बंदी आणल्यावर बोरी गावातल्या लोकांनी उरल्या
सुरल्या राखेच्या पट्ट्याचे संरक्षण आणि जतन करायला सुरुवात केली आहे.
गावातील जून्या पिढीला या राखेचे महत्व माहिती नव्हते, पण आता गावतील लहान
मुलांनाही याबद्दल माहिती आहे. इथे येणार्या पर्यटकांची नोंद याठिकाणी
एका वहीत केली जाते. ती पाहिले असता सुट्टीच्या दिवसात अनेक पर्यटक या
ठिकाणाला भेट देतात , पण जिओ टुरीझमच्या (Geo Tourism) दॄष्टीने या
परिसराचा काहीच विकास ग्रामपंचायतीने किंवा स्थानिक लोकांनी केलेला दिसत
नाही.
बोरी येथील ज्वालामुखीतील राख किंवा टेफ्रा
बोरी
गावात उत्खनन करतांना राखेच्या थराच्या वर Early Acheulian युगातली
हत्यारं मिळाली होती. टोबा ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेचे वय माहिती
असल्याने पुरातत्वशास्त्रात उत्खननात मिळालेल्या वस्तूंचे वय ठरवतांना ती
वस्तू राखेच्या थराच्यावर की खाली थराच्या खाली मिळाली यावरुन निश्चित करता
येते.
मोरगाव येथील ज्वालामुखीतील राख किंवा टेफ्रा
दोन
वर्षापूर्वी आमच्या जिओलॉजीच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासदौर्या दरम्यान
श्री बोरकर सर आणि श्री अभिजीत घोरपडे सर यांच्या बरोबर मोरगाव येथील
"टोबा" ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख पाहाण्याची संधी मिळाली मोरगाव
येथे कर्हा नदीच्या तीरावर (18° 27′ 82″N, 74° 32′ 39 E) असलेली टोबा
ज्वालामुखीची राख, मातीच्या दोन थरांमध्ये पसरलेली पाहायला मिळते. राखेच्या
या थराची कमाल उंची २० सेंटीमीटर पर्यंत आहे. या ठिकाणी टोबा ज्वालामुखीची
राख मातीच्या दोन थरांमध्ये कशी राहिली असावी ? असा प्रश्न पडतो. यासाठी
एक सिध्दांत (Theory) मांडला जातो की, "ज्वालामुखीची राखेचा थर नदीच्या
किनारी पसरलेला होता . त्याकाळात नदीला पूर येऊन गाळाचा थर त्यावर पसरला
असावा." त्यामुळे ही राख मातीच्या दोन थरांमध्ये अडकून राहीली आणि आजही
आपल्याला ती पाहायला मिळते. पांढर्या शुभ्र रंगाचा थर दोन मातीच्या
थरांमध्ये पसरलेला दिसतो. ही राख हाताळली तर भुसभुशीत लागते.
वाळुच्या थरात असलेला टेफ्राचा थर
ज्वालामुखीतून
राख बाहेर फ़ेकली जाण्यासाठी पुढील पैकी तीन गोष्टी घडाव्या लागतात. १)
मॅग्मावरील दाब कमी होऊन त्यात वायूचे बुड्बुडे तयार होण्याच प्रामण वाढत
जाते. (magmatic), २) तप्त मॅग्मा आणि भूगर्भातील पाणी यांचा संपर्क येऊन
स्फोटक मिश्रण तयार झाल्यास (hydrovolcanic) ३) ज्वालामुखीतील वाफेच्या
दाबामुळे खडकांचे विखण्डन झाल्याने (phreatic). या तिन्ही गोष्टी
ज्वालामुखीतून बाहेर पडणार्या राखेतील घटक निश्चित करतात. या राखेतील
मुख्य घटक असतो ज्वालामुखी जन्य काच . या काचेच्या गुणधर्मावरुन ती राख
कुठल्या ज्वालामुखीची आहे हे ओळखता येते. बोरी व मोरगाव येथे सापडलेल्या
राखेचा अभ्यास करुन त्याची तुलना इंडोनिशिया व जगाच्या इतर भागात
सापडलेल्या टोबा ज्वालामुखीच्या राखेशी केल्यावर ती राख ७५००० वर्षापूर्वी
विस्फ़ोट झालेल्या ज्वालामुखीची आहे हे सिध्द झाले.
सुसरोंडीची (पालशेत) अश्मयुगीन गुहा.
९०,००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, सुसरोंडी, पालशेत, तालुका :- गुहागर ( Acheulian cave at Susrondi, Palshet, Taluka Guhagar)
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात पालशेत नावाचे प्राचीन गाव आहे. गुहागरपासून हेदवीकडे जाताना पालशेत लागतं. गुहागरपासून साधारण १३ किलोमीटरवर वसलेले, नारळी पोफळीच्या, आंब्याच्या बागांनी नटलेले गाव जुन्या बंदराचे गाव म्हणजे पालशेत. गावात नागमोडी रस्ते आणि त्या रस्त्यांच्या उतारावर वसवलेली माडीवजा सुंदर कौलारु घरे. इथेही बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. भरपूर वनराई, मंदिरं, डोंगर, नद्या, समुद्रकिनारा असं सारं असूनही इथे पर्यटकांची गर्दी नसते. आणि म्हणूनच इथला निसर्ग स्वत:चं वैभव व्यवस्थित टिकवून आहे कदाचित. गावातून हेदवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मारुती मंदिर आहे. या मंदिराशेजारी सती वृंदावन व सतीशिळा आहे. वृंदावनावरच्या शिळांवर पावले कोरलेली आहेत. समोर नंदीसदृश शिळा दिसते. पालशेत गावातील विचारे घराण्यातील सती गेलेल्या साध्वीचे हे वृंदावन असून त्यांच्या वंशजांनी वृंदावनाचा जीर्णोद्धार केला आहे. सतीशिळा मात्र वृंदावनापासून १५-२० फूट लांब एका खासगी जागेत आहे. या शिळेवर काटकोनात दुमडलेला हाताचा पंजा दिसतो. त्याखालील चिन्हे जमिनीत असल्याने दिसत नाहीत. या शिळेला देवत्त्व दिले गेले असून गावकरी सतीशिळेबद्दल अनभिज्ञ आहेत. कोकणात अशी अनभिज्ञता अनेक ठिकाणी आढळते.इथूनच लक्ष्मीनारायण मंदिराकडे जाणारा फाटा फुटतो.
पालशेत गावातून एक चढणीचा रस्ता वर सुसरोंडीच्या गुहेकडे जातो. गुहा तशी अडचणीच्या ठिकाणी असल्याने गावातलाच एखादा वाटाड्या घेतल्यास उत्तम.
पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन (Periplus of the Erythraean Sea) या इसवीसनाच्या पहिल्या शतकात एका ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पुस्तकात कोकण किनारपट्टीतील काही बंदरांचा उल्लेख आहे. त्यात ‘पालमपट्टई’ नावाच्या बंदराचा उल्लेख आहे. हे बंदर म्हणजे आजचे पालशेत असावे असे काही तज्ञांचे मत आहे. या बंदरातून ग्रीस आणि रोम यांच्याशी व्यापार तिसऱ्या शतका दरम्यान चालत होता. पालशेत गावतील लक्ष्मी नारायण मंदिराजवळ आजही मध्ययुगीन बंदराचे अवशेष पाहायला मिळतात.
आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा, पालशेत
पालशेत गावातील सुसरोंडी भागात अंदाजे ९०, ००० वर्षापूर्वी आदिमानवाचे वास्तव्य असलेली गुहा सापडलेली आहे. याशिवाय या भागात मांडवकरवाडी (पालशेत), चिंद्रावळे (हेदवी-नरवण) इत्यादी अनेक गुहा विखुरलेल्या आहेत. या गुहांमुळे या भागाला गुहागर ("गुहाचे आगार" या अर्थी ) असे नाव पडले असावे. भारताला लाभलेल्या ७५०० किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी आत्तापर्यंत केवळ गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्या जवळच्या २५ ते ३० किलोमीटरच्या पट्ट्यात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा सापडलेल्या आहेत. भारतात आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहा यापूर्वी डोंगरावर किंवा पठारी भागात सापडलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील गुहांचे महत्व अधोरेखित होते. डेक्कन कॉलेजचे डॉ. अशोक मराठे यांनी २००१ मध्ये या गुहेमध्ये उत्खनन केले होते.
पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी (बारभाई) आहे. या बौद्धवाडीतून एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. चिर्यांनी बांधलेल्या चढाईच्या वाटेला कोकणात घाटी म्हणतात. दोन्ही बाजूला चिर्यांच्या गडग्यांचे कुंपण केलेल्या आंब्या-काजूच्या बागा आहेत. त्याच्या दाट सावलीतून चढत जाणाऱ्या वाटेने १५ मिनिटात एका फाट्यावर येतो. येथून उजव्या बाजूची वाट दाट जंगलातून जाते. या वाटेने १० मिनिटे चढाई केल्यावर आपण सुसरोंडीच्या सड्यावर पोहोचतो. खाली दुरवर दाट झाडीत लपलेली मांडवकरवाडीतली लाल कौलांची घर दिसत असतात. त्या वाडीतही आदिमानव कालिन गुहा आहेत.
सुसरोंडीचा सडा उभा आडवा पसरलेला आहे. सड्यावर लक्षात ठेवण्यासारखी कुठलीही खूण नाही. लोकांचा वावर नसल्याने मळलेल्या वाटा नाहीत. त्यामुळे गुहा बघायला जायचे असेल तर गावातून माहीतगार सोबत असणे आवश्यक आहे. वाटेने खाली उतरताना जांभ्या दगडात कोरलेल्या काही पायाऱ्या लागल्या. पायाऱ्या उतरल्यावर एक ओढा लागला. हा ओढा पुढे सुंदरी नदीला जाउन मिळतो. ओढा ओलांडून पलीकडे जाऊन पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने थोडे चालून गेल्यावर प्रवाह एका कड्यावरून १५ ते २० फूट खाली उडी मारतो. पावसाळ्यात या ठिकाणी ७ धारा असलेला धबधबा पडतो. पण पावसाळ्यांत पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणी येणे धोकादायक आहे.
धबधबा आणि उजवीकडे गुहा
अश्मयुगीन गुहेकडे जाणार्या वाटेचा नकाशा
धबधब्याच्या कड्यावरून उजव्या बाजूला गुहेच तोंड दिसते. या भागात माणसांचा वावर नसल्यामुळे जंगली प्राणी गुहेत असण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे जाण्यापुर्वी हाकारे घालणे सुरक्षित. मग धबधब्याच्या बाजूने खाली उतरायला सुरुवात करायची. याठिकाणीही जांभ्या दगडात कोरलेल्या पायाऱ्या पाहायला मिळतात. प्रवाह ओलांडून आपण धबधब्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या प्रवाहामुळे धबधब्याच्या खाली खोल डोह तयार झाला आहे. आजूबाजूच्या वृक्षाची मुळे धबधब्याच्या कातळ भिंतीवरून खाली उतरलेली आहेत.
आदिमानवाचे वास्तव्य असलेल्या गुहेचे तोंड
इसवीसन २००१ साली डॉ मराठे इथे आले तेंव्हा गुहेचे तोंड झाडी झूडूपांनी झाकलेले होते. गुहेत कोणी असेल तर बाहेर यावे यासाठी त्यांनी सोबत आणलेले फटाके गुहेच्या तोंडावर वरून टाकले. त्यांनतर सोबत आलेल्या एका कातकऱ्याला दोर बांधून गुहेच्या तोंडा जवळ उतरवले. त्याने झाडी झुडपे तोडून गुहेत प्रवेश केला. गुहेच्या भिंतींवर, छतावर त्यावेळी पाली आणि कोळ्यांचे राज्य होते. मशाली पेटवून आगीचा धाक दाखवून त्यांना पळवून लावण्यात आले. प्राथमिक शोध घेतांना या गुहेच्या जवळ अश्मयुगीन परशु / फ़रशी (Cleavers) सापडले. त्यामुळे त्यांनी सुसरोंडी येथे उत्खनन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही दिवसात सध्या गुहेजवळ जाण्याचा मार्ग आहे तो बनवला.
जांभा दगडात बनलेल्या गुहेच्या तोंडातून आत प्रवेश करायचा. कोकणात सर्वत्र दिसणारा लाल रंगाचा जांभा दगड हा ज्वालामुखीजन्य काळ्या पाषाणापासून म्हणजेच बेसॉल्ट पासून बनलेला आहे. लाखो वर्षे मंदगतीने बेसॉल्ट खडकाची झीज दोन प्रकारे होत असते. १) भौतिक विच्छेदन (Physical disintegration) आणि २) रासायनिक विघटन (Chemical Decomposition). भौतिक विच्छेदनामुळे खडकाचे तुकडे होतात तर रासायनिक विघटनामुळे पाण्यात विरघळणारे आणि पाण्यात न विरघळणारे असे दोन प्रकारचे पदार्थ तयार होतात. पाण्यात विरघळणारे पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जातात त्यामुळे दगड जाळीदार होतो आणि न विरघळणारे पदार्थ मागे राहातात. त्यातील लोहाच्या ऑक्साईडमुळे जांभा दगडाला तांबडा रंग येतो. कोकणात दिवस आणि रात्रीच्या तापमानात असलेला फ़रक आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काळ्या पाषाणाचे भौतिक विच्छेदन आणि रासायनिक विघटन परिणामकारकरित्या होऊन जांभा दगड तयार झाला आहे. सुसरोंडीच्या गुहेची निर्मिती अशाच प्रकारे जांभ्या दगडाचे भौतिक विच्छेदन आणि रासायनिक विघटन होऊन झालेली आहे.
गुहेच तोंड १.५ मीटर रुंद आणि २.५ मीटर उंच आहे. गुहेत प्रवेश केल्यावर आतील भाग ५ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद आहे. येथून गुहेत पूर्वेला आणि उत्तरेला जाणाऱ्या दोन वाटा फुटल्या आहेत . या वाटाची उंची जेमतेम २ मीटर आहे. त्यात सध्या वाटवाघुळांचे वास्तव्य असल्याने आत जाता येत नाही. यातील उत्तरेकडील वाट लांबवर जाते असे स्थानिक लोक सांगतात. गुहेत आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधाण्यासाठी डॉ मराठे यांनी गुहेच्या तोंडाजवळ ३ मीटर लांब २ मीटर रुंद आणि ४.२ मीटर खोल खड्डा (Trench) घेतला. या उत्खननात विविध स्तरावर (खोलीवर ) त्यांना आदिमानवाने वापरेली २२ दगडी हत्यारे सापडली. त्या हत्यारांच्या जडणघडणी वरून त्याचा काळ निश्चित करता येतो. त्यावरून साधारणपणे ९0000 वर्षांपासून याठिकाणी मानवाचे वास्तव्य होते असे दिसून आले.
प्रागैतिहासिक काळात मानव समुहाने राहात होता. तो भटक्या होता तरी उन, वारा पाऊस यांच्या पासून संरक्षण मिळवण्यासाठी तो नैसर्गिक गुहांचा आश्रय घेत होता. कंदमुळे, फ़ळे गोळा करणे, शिकार करणे इत्यादीसाठी त्याने निसर्गात उपलब्ध असलेल्या दगडाचाच हत्यार म्हणूम वापर केला. सुरुवातीच्या काळात दगडाचे मोठे कपचे काढून ओबडधोबड हत्यारे बनवली जात. त्यांना Abbevillian tools म्हणून ओळखले जाते. काळानुरुप हत्यारात सुधारणा होऊन ती प्रमाणबध्द , सुबक, धारदार आणि आकाराने छोटी झाली. त्यांना Acheulean tools म्हणून ओळखले जाते. त्यापुढील काळात लाकडात किंवा हाडामध्ये दगडी पाती अडकवून त्याने हत्यारे बनवली अशा हत्यारांना Composite tools म्हणून ओळखले जाते.
पूर्वपुराणाश्मयुगातील गुहा , एक कल्पनाचित्र
Acheulian Stone tools found in cave at Susrondi Courtesy :-Paper published by Dr Marathe
पूर्वपुराणाश्मयुगातील गुहेत सापडलेली हत्यारे
सुसरोंडीच्या गुहेत केलेल्या उत्खननात सापडलेली दगडी हत्यारे बेसॉल्ट दगडापासून बनवलेली होती. यात ३ हातकुर्हाड (Hand Axe) २ अश्म परशु / फ़रशी (Cleavers) , ४ कुदळ (Picks), १४ चाकू (Choppers), २४ तासणी (सोलणी) (Scrappers) ही हत्यारे सापडली. ही हत्यारे बनवण्यासाठी वापरण्यात आलेले दगड (Cores) आणि त्या दगडापासून हत्यारे बनवताना उडालेल्या ढलप्या (Flakes) ही याठिकाणी सापडल्या आहेत. इथे आणि वेळणेश्वर येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या मातीच्या नमुन्यांवरुन काही हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्या पेक्षा बरीच वर होती. त्यामुळे कंदमुळे, शिकार करुन अन्नसंकलन करणार्या आदिमानवाला समुद्रातूनही अन्न मिळत होते. जवळपासच्या भागात असलेल्या अन्नाच्या उपलब्धतेमुळे आणि गुहे जवळच असलेल्या गोड्या पाण्याच्या ओढ्यामुळे आदिमानवाने या गुहेचा आश्रय घेतला होता.
गुहा पाहून झाल्यावर आलेल्या वाटेने न उतरता दुसर्या वाटेने खाली उतरुन गावातील लक्ष्मी नारायण मंदिर गाठावे. मंदिरा जवळ एक जांभ्या दगडात बांधलेली इंग्रजी 'L" अक्षराच्या आकाराची बारव आहे.. याच आवारात असलेल्या शिवमंदिरातील काळ्या पाषाणातील गणपतीची आणि नंदीची मुर्ती सुंदर आहे. मंदिराच्या पुढे पालशेतच्या प्राचीन बंदराचे अवशेष आहेत. या ठिकाणी ४ बुरुज आणि खाली उतरण्यासाठी पायर्या बांधलेल्या आहेत. या ठिकाणी केलेल्या उत्खननात नांगर आणि बोटी बांधण्याचा लोखंडी कड्या सापडल्या होत्या. या बुरुजांच्या काटकोनात एक ४ फ़ूट उंच भिंत आहे. त्याला ठराविक अंतरावर कमान असलेले दरवाजे आहेत. भरती ओहोटीचे पाणी बंदरात नियंत्रित करण्यासाठी Lock gates असतात तशी योजना येथे केलेली असावी. या भागात आता जंगल आणि बागायती असल्याने संपूर्ण परिसर पाहाता येत नाही. ते गाळाने भरले असून पडझडही होत आहे. आताचा समुद्रकिनारा आणि बंदर या प्राचीन बंदरापासून २-३ किलोमीटर लांब आहे.
या प्राचीन बंदराच्या पुढे गावाचा काळे वठार नावाचा भाग लागतो. इथे एक प्राथमिक शाळा आहे. या शाळेत रस्त्यापासून पायऱ्या उतरून खाली जावे लागते. या पायऱ्यांच्या कडेला एका बांबूच्या बेटाशी एक अत्यंत रेखीव विष्णूमूर्ती काळाचे आघात सोसत, ऊनापावसात उभी आहे. मूर्तीचा चेहरा व चारपैकी दोन हात भग्न आहेत. इथे थोडी अंधश्रद्धा असल्याने मूर्तीसमोर नारळ ठेवले जातात. या मूर्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही पावले त्वरित उचलणे गरजेचे आहे.याशिवाय गावात प्राचीन वाट आणि त्यावरील अंतर दाखवणारे कोसाचे (मैलाचे) दगड हे प्राचीन अवशेष पाहायला मिळतात.
प्राचीन बंदराचे पाणी जाण्यासाठी द्वार ( Lock Gates in Ancient Palshet dock )
पालशेत येथील प्राचीन व्यापारी मार्गावरील अंतर दर्शवणारा दगड (Mile stone on ancient route at Palshet )
हिच प्राचीन वाट पुढे पालशेत - वेळणेश्वर रस्त्यावर असलेल्या अडूर गावाच्या सड्यावर जाते. त्यावर असलेले कोसाचे दगड , पांथस्थांसाठी बांधलेली बारव आणि विश्रांतीसाठी पुरातन वृक्षांच्या भोवती बांधलेले पार बघता येतात.हेदवीकडे जाताना ‘काकस्पर्श’ चित्रपटाचे चित्रीकरण झालेला पालशेतमधील नेनेवाडा पाहणाऱ्या पर्यटकांनी ही ठिकाणंसुद्धा आवर्जून पाहायला हरकत नाहीत.हेदवीकडे जाताना ‘काकस्पर्श’ चित्रपटाचे चित्रीकरण झालेला पालशेतमधील नेनेवाडा पाहणाऱ्या पर्यटकांनी ही ठिकाणंसुद्धा आवर्जून पाहायला हरकत नाहीत.
अडूर येथील बारव ( Step well, Adur )
जाण्यासाठी :-
चिपळूण पासून पालशेत गाव ४५ किलोमीटर अंतरावर आहे. चिपळूणहून थेट पालशेतला जाण्यासाठी फ़ार कमी एसटीच्या बसेस आहेत. त्यामुळे चिपळुणहून दर अर्ध्या तासाला सुटणार्या चिपळूण - गुहागर एसटीने शॄंगारतळी किंवा मोडका आगार याठिकाणी उतरुन रिक्षा अथवा वडापने पालशेतला जाता येते.
पालशेत गावातून दोन मार्गांनी सुसरोंडीच्या गुहेत जाता येते.
१) पालशेत गावातून एक रस्ता पोमेंडी गावाकडे जातो. या रस्त्यावर बौद्धवाडी, बारभाई आहे. या बौद्धवाडीतून एक प्राचीन वाट सुसरोंडीच्या सड्यावर जाते. या चढाईच्या मार्गाने गुहेपर्यंत जाण्यास पाऊण ते एक तास लागतो.
२) पालशेत गावातून पक्का रस्ता निवोशीला जातो . या रस्त्यावर एक मोबाईल टॉवर आहे त्याजवळून एक वाट सड्यारुन सुसरोंडीच्या गुहेजवळ जाते. या मार्गाने मोबाईल टॉवर ते गुहेपर्यंत जाण्यास अर्धा तास लागतो.
पालशेत गावातील पुरातन अवशेषांचा नकाशा,
केळोशी येथील गुहा :-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळोशी येथे प्राचीन गुहेचा शोध घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कातळखोदशिल्प सापडली आहेत. प्रश्न निर्माण झाला कि कातळ खोदचित्र तयार करणारा माणूस कुठे राहायचा ? असा प्रश्न आल्यावर त्याकाळचा मानव गुहेत राहात असावा असा समज असतो. त्यामुळे या परिसरात कुठे गुहा आहेत का याचा शोध सुरू झाला. तो राहाण्याची ठिकाणं शोधली जाऊ लागली.
केळोशी येथील या गुहेत आदिम काळातली हजारो हत्यारं सापडली आहेत. त्यासाठी वापरलेले दगड जवळपासच्या नदीपात्रातूनच आणली असावीत असा अंदाज आहे. त्या काळात माणूस याच गुहांमध्ये बसून हत्यारं बनवत असावा असं तज्ज्ञांना वाटतं. हे शोधण्यासाठी दोन ठिकाणी आम्ही ट्रेन्चेस घेतल्या होत्या. त्या ट्रेन्चेसमध्येच आम्हाला खूप सारी दगडी हत्यारं मिळाली. जवळपास हजाराच्या संख्येनं दगडी हत्यारं मिळाली. त्यानंतर हे मटेरियल कुठनं आणलं असेल याचा शोध सुरु केला. हे कोकणात मिळणारं मटेरियल नाही किंवा सिंधुदुर्गात मिळणारं मटेरियल नव्हतं. कुठं मिळतं ते? तर जिथे वॉटर बॉडी आहे, नाला आहे, नदी आहे अशा ठिकाणी मिळतात. त्याचा आम्ही शोध घेतला. दोन दोन किलोमीटर नदीपात्रातच मिळाला. असा अंदाज आला की हा माणूस तिकडनं दगडं उचलून या गुहेत आणायचा आणि गुहेत बसून तो दगडी हत्यारं बनवत होता. त्यामुळं याला पुष्टी मिळाली की ही हैबिटेशनल साईट होती. इथं माणूस राहिला होता बरीच वर्षं. आणि इथं बसून तो हत्यारं बनवत होता.
साताऱ्यातील अश्मयुगीन मानवी संस्कृती सातारा जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मध्ययुगीन महाराष्ट्र आणि मराठ्यांचा इतिहास यात सातारा जिल्ह्याला नेहमीच मोठे स्थान लाभलं आहे. याच साताऱ्यात किमान २-३ लाख वर्षांपूर्वीच्या आदिमानवाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा सापडल्या आहेत. कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंतचा समज होता. पण या संशोधनानं कृष्णा नदीच्या उगमानजीक आदिमानवाचं अस्तित्व होतं हे सिद्ध झालं आहे. साताऱ्यातील उरमोडी नदीच्या पात्रालगत आणि इतर काही भागांत आद्य-पुराश्मयुगीन मानवी संस्कृतीचा शोध लागला आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रीसर्च इन्स्टिट्यूटमधील संशोधक यावर काम करत आहेत.
कृष्णा नदीच्या खोऱ्यातील प्लेइस्टोसिन काळातील मानवी संस्कृती शोध घेण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. या प्रयत्नातील हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. उरमोडी नदीनजीक शहापूर, वेचळे, वळसे, माजगाव, अतीत, निसराळे आणि कृष्णा नदीजवळ मेणवली इथं या संस्कृतीचं अस्तित्व आढळलं आहे. सापडलेल्या शस्त्रांत फरश्यांचा समावेश मोठ्याप्रमाणावर आहे.कृष्णेच्या खोऱ्यातील अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वावर अनेक वर्षं संशोधन सुरू आहे. पण कृष्णेच्या उगमानजीक अश्मयुगीन मानवाचं अस्तित्व नव्हतं, असाच आतापर्यंत समज होता. तसंच, बेसाल्टचा दगड अश्मयुगीन काळात हत्यारं बनवण्यासाठी योग्य नाही, असा ही समज होता. हे दोन्ही समज या संशोधनानं खोडून काढले आहेत. १८६३ मध्ये रॉबर्ट ब्रूस फूट यांना पल्लावराम (तत्कालीन मद्रासजवळ) इथं काही दगडी हत्यारं सापडली, ज्यात 'हातकुऱ्हाड'चा समावेश होता. त्यानंतर भारताच्या इतर भागांमध्ये संशोधन सुरू झालं. परंतु डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) दगड असलेल्या भागांमध्ये अश्मयुगीन हत्यारं मिळत नव्हती. घनदाट जंगल आणि डोंगराळभागामुळे या अडचणी येत असाव्यात. त्यामुळे असा समज निर्माण झाला होता की अश्मयुगीन मानव या भागामध्ये वास्तव्यास नव्हता. योगायोगानं १९५२ मध्ये गंगावाडी येथे (गंगापूर जवळ) मातीच्या धरणाच्या बांधकामासाठी खोल खड्डे घेतले जात असताना त्यामध्ये काही मानव निर्मित अश्मयुगीन दगडी हत्यारे आढळून आली.
अतीत इथं नदी किनारी अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं सापडली.
सापडलेल्या शस्त्रांत फरश्यांचा समावेश मोठ्याप्रमाणावर आहे.
प्रोफेसर ह. धि. संकलिया यांनी त्या हत्यारांचा अभ्यास केला. त्यानंतर डेक्कन ट्रॅप भागामध्ये संशोधन केलं असता कऱ्हा, घोड, भीमा यासारख्या नदी आणि परिसरांमध्ये सुद्धा अनेक साईट्स सापडल्या. पुढे डॉ. आर. एस. पप्पू यांनी कर्नाटकातील अनगवाडी आणि परिसरात मोठ्याप्रमाणावर पाषाणयुगातील साईट्स शोधल्या होत्या. तर १९८६ला काळे व त्यांच्या सहकाऱ्यांना कर्नाटकातील येडूरवाडी येथे विविध विलुप्त प्राण्यांच्या प्रजातींचे जीवाश्म आणि कॅल्शियम कार्बोनेटचे आवरण असलेले झाडांचे बुंधे आणि १०० च्या आसपास पाषाण युगातील हत्यारे सापडली होती. या साईटचे कालमापन केले तेव्हा ते ३.५ लाख वर्षांहून अधिक जुने आहे, असे लक्षात आले. या गावांतून मोठ्याप्रमाणावर दगडी हत्यारं शोधता आली आहेत. ही संख्या ३०० पेक्षा जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात डेक्कन ट्रॅप (बेसाल्ट) भागातील कृष्णा खोऱ्यातून या पाषाणयुगातील दगडी हत्यारं मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. छिलका हत्यारांचा समावेश असलेल्या या परंपरेला अॅश्युलियन संबोधले जाते. अॅश्युलियन संस्कृतीमध्ये (लार्ज फ्लेक अॅश्युलियन) १० सेंटीमीटरपेक्षा मोठ्या छिलक्यांपासून हत्यारं तयार करत असत. बेसाल्ट दगड लवकर झिजतो, त्यामुळे कृष्णा खोऱ्यात या युगातील हत्यारं जास्त प्रमाणात मिळणं कठीण असतं. पण यावेळी ही मिळाली. नदीचा प्रवाह हा सध्या आहे तेथूनच लाखो वर्षे वाहत असल्याचंही या या अभ्यासातून दिसते. मोठ्या छिलक्यांपासून बनवलेल्या या हत्यारांमध्ये फरश्या (Cleavers) व तासण्या (Scrapers) यांची संख्या जास्त आहे. त्यातही फरश्याचं प्रमाणात जास्त आहे. त्याकाळात पाऊस जास्त होत असावा, त्यामुळे वनस्पतींची वाढ ही मोठी होत असणार. त्या वनस्पती तोडण्यासाठी, त्यांची साल काढण्यासाठी फरश्यांचा वापर करावा लागत असणार. याशिवाय, छोट्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशा हत्यारांचा वापर होत असावा. त्याकाळात मोठी शिकार होत नसावी. इतर हिंस्र प्राण्यांनी केलेल्या मोठ्या शिकारींचा शिल्लक राहिलेला भाग मानवाला अन्न म्हणून उपयोगी पडत असे. त्यातही ही हत्यारं उपयुक्त ठरत असावीत.' या भागातून मिळालेल्या पाषाणांच्या या हत्यारांची चांगली संख्या लक्षात घेतली, तर या परिसरात त्या युगात मानवाची जास्त लोकसंख्या होती, असा निष्कर्ष काढता येतो.
वाघबीळ " उर्फ " नाचणटेपाची गुहा किंवा गन्स ऑफ पाचाड जि.रायगड :-
रायगड – महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी, स्वराज्याचे प्रतिक. या किल्ल्याच्या आसपास अनेक ऐतिहासिक व नैसर्गिक स्थळे आहेत, परंतु काही स्थळे आजही सामान्य लोकांच्या माहितीच्या बाहेर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे – वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा, ज्याला "गन्स ऑफ पाचाड" या नावानेही ओळखतात. राजधानी रायदुर्गाच्या पश्चिमेकडील डोंगरामध्ये एक निसर्गनिर्मित अश्मयुगीन गुहा आहे. गुहेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिला तीन तोंडे आहेत. जगात अशा प्रकारच्या दोनचं गुहा आहेत एक युरोपातील "गन्स ऑफ नेव्हरॉन" आणि दुसरी म्हणजे ही "वाघबीळ" वाघबीळ ही एक नैसर्गिक गुहा असून ती पाचाडहून रायगडच्या दिशेने चढताना, चीत दरवाज्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या डोंगरात वसलेली आहे. ही गुहा समुद्रसपाटीपासून सुमारे ४५० मीटर उंचीवर स्थित आहे. वाघबीळ ही केवळ एक गुहा नसून ती निसर्ग, इतिहास आणि भूगर्भशास्त्र यांचं एक अद्वितीय मिश्रण आहे.
वाघबीळ ही अश्मयुगातल्या नैसर्गिक गुहांपैकी एक मानली जाते. त्या ठिकाणी डेक्कन कॉलेजचे अभ्यासक आर. व्ही. जोशी यांनी उत्खनन केले. त्यांना कोअर्स, तासण्या, छिलके, टोकदार पाती, नोक, वेधण, ट्रॅपिझ, आणि त्रिकोणी पद्धती मध्ये कोरलेल्या काही अवजारांचा आणि हत्यारांचा भाग मिळाला. त्या साधनांमुळे या नैसर्गिक गुहेमध्ये अश्मयुगीन मानव वास्तव्य करून असावा हे समजून आले. ती गुहा अत्यंत सुंदर आहे, परंतु गुहेच्या ठिकाणी पाण्याचा स्रोत मात्र सापडत नाही. पूर्वी तेथे काही ना काही पाण्याचा स्रोत असावा असे खात्रीपूर्वक वाटते. राजगड किल्ल्यावर असलेल्या नेढ्यांप्रमाणे या गुहेची रचना असूनही, हिचा अंतर्भाग अधिक प्रशस्त आणि खोल आहे. यामुळे ही गुहा कोकणातील 'हातखंबा गुहा' याच्याशी साम्य दर्शवते. वाघबीळची रचना खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या गुहेला एकूण तीन तोंडे आहेत: पश्चिमेस दोन लहान तोंडे पूर्वेस एक मोठे प्रवेशद्वार आजच्या काळात या पूर्वेकडील मोठ्या तोंडामधूनच प्रवेश केला जातो. गुहेचा आतला भाग प्रकाशमान, हवेशीर आणि मोकळा आहे. एकावेळी सुमारे २५ माणसे सहज राहू शकतात, इतकी ही जागा आहे. हे दर्शवते की ही गुहा फक्त वन्य प्राण्यांचा आसरा नव्हे तर मानव व पहारेकरी यांचाही मुक्कामस्थान होती. या गुहेचे ऐतिहासिक महत्त्व फार मोठे आहे. गुहा पश्चिमेकडील पाचाड व पूर्वेकडील रायगडवाडी या दोन महत्वाच्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची होती. यामुळे येथे पहारा व तोफा ठेवण्याची व्यवस्था केली जात असे. विशेषतः १७७३ साली रायगडवर झालेल्या मोर्चेबंदीच्या वेळी, या गुहेचा उपयोग तोफेच्या धमधमे रचण्यासाठी केला गेला होता. त्यावेळी रायगडाच्या चार प्रमुख बाजूंना मोर्चे बांधले गेले होते: १ ) चीत दरवाजा जवळ २ ) रायगडवाडी येथे ३ ) घळकीच्या मेटाजवळ ४ ) नाचणटेपाजवळ (वाघबीळ जवळ) या मोर्च्यांमध्ये नाचणटेपाजवळील वाघबीळ गुहा रणनितीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची ठरली होती. एकाचवेळी दोन्ही बाजूचा परिसर या गुहेतून न्याहाळता येतो. शिवस्वराज्यात या गुहेतून पाचाडकोट आणि रायदुर्गावर नजर ठेवली जातं असेल, यात काही शंका नाही,तशी ती टेहळणीसाठी उत्तम जागा आहे.रायगडवाडीकडील अर्धवर्तुळाकार गुहेतून रायदुर्गाचे मनमोहक दृश्य दृष्टीक्षेपास पडते. तसेच कोकणदिवा, कावल्या-बावल्या खिंड आणि पावसाळ्यात कोसळणारे अनेक धबधबे याचे विहंगम दृश्य पहावयास मिळते. दुसऱ्या बाजूच्या गुहेतून जिजाऊंचा पाचाडकोट नजरेस पडतो. या गुहेला हि तीन नाव असण्याची कारणे म्हणजे १) नाचणटेपाची गुहा:- नाचण म्हणजे 'नाचणी' आणि टेप म्हणजे 'छोटी टेकडी'.नाचणी हे कोकणवासीयांचे प्रमुख धान्य आहे,ते साठवून ठेवण्यासाठी या गुहेचा वापर केला जातं असे. त्यामुळे 'नाचणटेपाची गुहा' हे स्थानिकांनी दिलेले नावं आहे. २ ) वाघबीळ:- पाचाड कोट परिसरातून या गुहेकडे पाहिल्यावर तिचे दोन धिद्र हे वाघाच्या डोळ्यासमान दिसतात. त्यामुळे 'वाघबीळ' हे नावं देण्यात आले. ३ ) गन्स ऑफ पाचाड:- वाघबीळ गुहेप्रमाणेच युरोपातील 'गन्स ऑफ नेव्हरॉन' या गुहेलाही तीन तोंडे आहेत. त्यामुळे इंग्रजी भाषेवर अधिक प्रेम करणाऱ्यांनी या गुहेला 'गन्स ऑफ पाचाड' नावं दिले आहे. आज रायगड किल्ल्याला भेट देणारे हजारो पर्यटक राजवाडा, महादरवाजा, टकमक टोक, गंगासागर तलाव, बाजारपेठ इ. बघतात. पण या वाघबीळ गुहेकडे फार थोडे लोक वळतात. निसर्गप्रेमी, इतिहास संशोधक, ट्रेकर्स आणि साहसी पर्यटकांसाठी ही गुहा एक खजिनाच आहे. पाचाडहून चढाई करताना ही गुहा मध्यभागीच लागते. त्यामुळे गडावर जाणाऱ्या मार्गात एक छोटासा वळसा घालून या गुहेला अवश्य भेट द्यावी. भेट देताना घ्यावयाची काळजी गुहा नैसर्गिक असल्याने प्रकाशाची मर्यादा असते – टॉर्च किंवा मोबाईल लाइट जवळ ठेवा. गुहेच्या तोंडावर व आतील भागात सरपटणारे किंवा वन्य प्राणी असू शकतात – त्यामुळे काळजीपूर्वक प्रवेश करावा. प्लास्टिक किंवा कचरा टाकू नये – ही एक ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा आहे. स्थानिक मार्गदर्शक घेतल्यास अधिक माहितीपूर्ण अनुभव मिळू शकतो. अश्मयुगीन गुहेत प्रवेश करण्यासाठी रायगड वाडीच्या दिशेला तोंड आहे. पाचाड खिंडीतून हॉटेलच्या मागून त्या ठिकाणी येण्यास छोटीशी सोपी वाट आहे. गुहेतून दुर्गदुर्गेश्वर रायगडचे सुंदर दर्शन होते. गुहेमधील घोंगावणारा वारा आयुष्यात एकदा तरी अनुभवावा. मात्र या विशुद्ध नैसर्गिक जागेला कोणतीही हानी न पोचवता ‘वाघबीळ’ किंवा ‘नाचणटेपाची गुहा’ येथील मुक्काम जरूर करावा. अश्मयुगातील मानवी जीवन काय असू शकेल याची उजळणी मात्र नक्की करता येईल.
अमरावती जिल्ह्यातील अश्मयुगीन चित्रशाळा :-
अमरावतीपासून उत्तरेस ९० किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या सातपुडा पर्वताच्या कुशीत सुमारे २० ते ३० किलोमीटरच्या परिसरात ही गुहाचित्रे विखुरली आहेत. त्यातील चित्रे काहीशी पुसट झाली असली तरी ओळखू येण्याइतपत चांगल्या स्थितीत आहेत. सुमारे १५ ते २० हजार वर्षांपूर्वी अश्मयुगातील मानव जेव्हा समूहाने राहायचा त्यावेळी तो सुरक्षा, अन्न, पाणी इत्यादी बाबींचा अभ्यास करून आश्रयस्थानांची निवड करायचा. वनातील कंदमुळे खाऊन आणि शिकार करून त्यावर तो आपली उपजीविका चालवत असे. प्रामुख्याने शिकार हा प्रमुख व्यवसाय असल्याने प्राण्यांच्या शिकारीचे अशा चित्रांद्वारे नियोजन करून त्यावर जादूटोणा करून शिकार आपल्या टप्प्यात आणण्याची अंधश्रद्धा पूर्वीच्या मानव समूहात होती. धोकादायक प्राणी आणि उपयुक्त प्राण्यांचे ज्ञान समूहातील तरुणांना व्हावे यासाठी शिक्षण संवादाचे साधन म्हणून या गुहाचित्रांचा त्यावेळी वापर केला जात असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अमरावतीहून सुमारे ८५ किमी अंतरावर मोर्शी ते चांदूरबाजार चिखली सावंगीमार्गे धारूर गावाजवळून दिसणार्या सातपुडा पर्वतावर सर्वात उंचीवर असलेल्या मुंगसादेव या १४३ फूट, २५ फूट रुंद आणि तेवढ्याच उंचीच्या रहस्यमयी गुहेत प्रचंड शिळेवर ही चित्रे काढलेली आहेत. त्यात आहेत वन्यप्राणी, वाघ, हत्ती, जिराफासारखा प्राणी, गेंडा, रानगवे, सांबर, चितळ, रानडुक्कर, अस्वले, वानर, रानकुत्रे, गिधाड, इ. गेरूसारख्या लाल रंगात ती साकारली आहेत. एवढेच नाही तर एका गुहेत झाडावरील फांदीला झोके घेणार्या आदिमानवाचे चित्रही तेथे काढले आहे.
या मानवाचे पाय मात्र वानरांच्या पंजासारखे दाखवले गेले आहेत. कळपाने राहणार्या वन्यप्राण्यात एके ठिकाणी रानकुत्र्यांचा कळप चित्रित केला आहे. जवळपास ७०-८० फूट रुंदीच्या आणि ४० फूट उंचीच्या या धनुष्यबाणासारख्या अर्धगोलाकार शिळेवरील या चित्रांचं वैशिष्ठ्य म्हणजे ती तळापासून चार फूट उंचावर डावीकडून उजवीकडे शेवटपर्यंत विशिष्ट अंतरावर निर्माण केली आहेत. पाच- पंचवीस जणांच्या समूहाला समोर बसवून ती प्रत्येकाला दिसू शकतील अशी त्यांची रचना आहे. हजारो वर्षांपूर्वी अश्मयुगातील आदिमानव जेव्हा समूहाने पर्वतावरील गुहेत राहायचा त्यावेळी तो शिकार व कंदमुळे खाऊन जगायचा. धोकादायक प्राणी कोणता आणि उपयुक्त कोणता याचे ज्ञान समूहातील तरुणांना व्हावे यासाठी शिक्षण व संवादाचे साधन म्हणून या गुहाचित्रांचा वापर केला असावा, असेही म्हटले जाते. थोडक्यात आदिमानवाची ती माहिती तंत्रज्ञान केंद्र असावीत. ही सर्व चित्रे दिवसा सूर्यप्रकाशात सहजपणे दिसू शकतात. प्रकाशाकरिता कशाचाही वापर येथे करावा लागत नाही हे या गुहाचित्रांचे वैशिष्ठ्य आहे. गुहाचित्रातील सर्व चित्रे वन्यप्राण्यांची असून केवळ गिधाड या एकमेव पक्ष्यास येथे स्थान देण्यात आले आहे. एकाच रंगात सांबर-चितळाची चित्रे काढण्याचे काम वाखाणण्यासारखे आहे. यावरून त्या काळातील मानवाचे रंगज्ञान किती प्रगल्भ होते याची कल्पना येते. भारतात अशा प्रकारची गुहाचित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे आहेत. जगात फ्रान्स, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया येथेही अशा प्रकारची गुहाचित्रे आहेत. या गुहाचित्रांच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की पूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका हे तीनही देश एकाच खंडात होते. गोंडवाणा लँड म्हणून हा खंड ओळखला जात असे. कालांतराने भूगर्भातील हालचालींमुळे भारत चीनकडे सरकला. ऑस्ट्रेलिया, आफ्रिका हे देश वेगळे झाले. त्यामुळे तेथे राहणारा मानव व वन्यप्राणी यांची जणुकं एकच होती व त्यांची जगण्याची पद्धतीही सारखीच होती. त्यावेळचा आफ्रिकेतील आदिमानव रेतीवर वन्यप्राण्यांच्या बोटाने रेखाटन करून त्याची ओळख समूहातील सदस्यांना करून देत असे, अशी माहिती या गुहाचित्रांच्या अभ्यासकांनी दिली. हिमयुगानंतर इंडोनेशियाच्या एका बेटावर विनाशकारी ज्वालामुखी जागृत झाला व त्याची कोट्यवधी टन राख आकाशात उडू लागली. वार्याच्या माध्यमातून ती जगभर पसरली. त्यात सूर्यही झाकोळला गेला. त्या राखेचे थर जमिनीवर व वनस्पतींवर साचले. त्यामुळे सर्वत्र दुष्काळ पडून तृणभक्षी व मांसभक्षी प्राणी त्यात बळी पडले. जगातील विविध प्राण्यांच्या, वनस्पतींच्या जाती नष्ट झाल्या. या नैसर्गिक आपत्तीतून बुशमन नावाचा आदिमानवाचा वंश दक्षिण आफ्रिकेतील कालाहारी येथे वाचला व नंतर तो जगभर पसरला.
आश्चर्याची बाब म्हणजे अशा प्रकारची गुहाचित्रे दक्षिण आफ्रिकेतही आढळून आली आहेत. कालप्रवाहात या वंशातील काही लोक उत्तर आफ्रिकेत स्थानांतरित झालेत. तेथून ते युरोपात पुढे उत्तर व दक्षिण अमेरिकेत गेले. त्यातीलच एक समूह भारतीय द्विपकल्पात स्थलांतरित होऊन पुढे ऑस्ट्रेलियात स्थानांतरीत झाला. ऑस्ट्रेलियात त्यांना अॅबॉरजीन्स म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे तेथेही अशी गुहाचित्रे आढळून आली आहेत. भारताचा विचार करता मध्य प्रदेशातील भोपाळजवळ नर्मदेच्या खोर्यात उत्तरेकडे भीमबेटका येथील विंध्य पर्वताच्या रांगांमध्ये अशा प्रकारची अश्मयुगीन गुहाचित्रे असून त्यावरून भारतातील मानवाच्या प्राचीन इतिहासाची ओळख होते. १९५७ मध्ये थोर पुराणवस्तू संशोधक डॉ. व्ही. एस. वाकणकर यांनी भीमबेटका येथे जवळपास ७८० गुहाचित्रे शोधली आहेत. पूर्व अश्मयुगाच्या आधीपासून पूर्व पाषाण ते मध्ययुगापर्यंतची ही चित्रे आहेत. पूर्व पाषाण युगातील चित्रांमध्ये मुख्यत्वे प्राण्यांची चित्रे असून त्यात रानगवे, अस्वल, रानकुत्रे व जिराफ यांची चित्रे आहेत. ही सर्व चित्रे लाल रंगात चितारली आहेत. मेसोलोथिक काळातील या चित्रांमध्ये मनुष्याच्या वेगवेगळ्या मुद्रेतील चित्रे आहेत. त्यात कुठे नृत्य करताना, कुठे शिकार करताना, तर कुठे लढाई करताना आहेत. मुंगसादेव येथे सापडलेल्या सातपुडा पर्वत रांगातील गुहाचित्रे भीमबेटकाच्या आग्नेय (दक्षिण पूर्व) दिशेला आहेत. समुद्रसपाटीपासून ५५० मीटर उंचीवर तर २१.५ उत्तर व ७८ पूर्व या अक्षांश व रेखांशावर आहे. तेथील खडक मुख्यत्वे खारपापासून बनलेले आहेत. याचा अर्थ तेथे कधीकाळी समुद्र असावा. गुहाचित्रांचा आकार ३० मीटर रुंद व १० मीटर उंच व आतील भाग १० मीटरपर्यंत आत गेला आहे. माणसाचा हात पोहचेल एवढ्या उंचीवर ही चित्रे काढली आहेत. यात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची चित्रे आहेत. गुहाचित्रांचे एकूण स्वरूप आर्ट गॅलरीसारखे आहे. प्रत्येक चित्राचा आकार १० ते १५ सेंमी असून ती प्रमाणबद्ध आहेत. चित्रांमध्ये रानडुक्कर, रानगवा, निलगाय, माकड, गेंडा, जिराफ, रानकुत्रे, तरस, चितळे, बारसिंगा आणि सांबर इ. वन्यप्राण्यांचा समावेश आहे. रानकुत्र्यांचा कळप एकत्रपणे चितारला आहे. यावरून त्यांच्या जीवनशैलीचा परिचय होतो. जिराफ ऑफ्रिकेतले असले तरी हजारो वर्षांपूर्वी जिराफ सदृश्य प्राणी येथे अस्तित्वात होता असे चित्रांवरून वाटते. चित्ता, बिबट, गेंडा, सायल, सिंह हे आफ्रिकेत आणि भारतीय द्विपकल्पात सामान्यपणे आढळत होते. या चित्रांवरून हे स्पष्ट होते की त्या काळात हे प्राणी या भागात राहत होते. काळाच्या ओघात आणि बदललेल्या नैसर्गिक वातावरणात एकतर ते लुप्त झाले किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले असावेत. या परिसराचे सखोल निरीक्षण केले असता तेथे आणखी गुहाचित्रे असावीत. तेथे आदिमानव समूह-समूहाने गुहेत राहत असावा. समूहातील लहान व तरुणांना प्राण्यांची माहिती व्हावी म्हणून या गुहाचित्रांचा उपयोग माहितीचे संप्रेषण करण्यासाठी होत असेल. शिकार करण्यालायक प्राणी कोणते, धोकादायक कोणते, त्यांचे आकार, राहण्याचे ठिकाण, वागणुकीची माहिती इ. ज्ञान या गुहाचित्रांच्या माध्यमातून दिले जात असावे. तापीच्या खोर्यात आतापर्यंत शोधलेल्या एकूण १८ गुहाचित्रांची चित्रशैली वन्यप्राण्यांचे प्रकार आणि भीमबेटका शैलाश्रयाचे सान्निध्य पाहता ही शैलाश्रयातील चित्रे पूर्व पाषाणयुगाच्या काळातील म्हणजेच १५ ते २० हजार वर्षांपूर्वीची असावीत, मात्र त्यांचा कालखंड निश्चित करण्यासाठी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. रेखाटलेल्या चित्रांवरून त्यामागील कार्यकारणभाव, प्राण्यांची माहिती समूहाला व्हावी आणि समूहातील प्रत्येकाने ती इतरांना द्यावी असा उद्देश असावा. या चित्रांची आणि जगात अन्यत्र सापडलेल्या गुहाचित्रांची तुलना करता या काळात जे आदिमानवांचे स्थलांतर झाले त्यात कोठेतरी एकसमान दुवा आहे. त्या चित्रांचे नाजूक स्वरूप व त्यांचे ऐतिहासिकदृष्ठ्या महत्त्व पाहता त्यांना त्वरित संरक्षण मिळणे गरजेचे असल्याची भावना या अमरावतीच्या रिसर्च टीमने व्यक्त केली आहे. हा एक जागतिक वारसा आहे. भीमबेटका इतकीच ही गुहाचित्रेही महत्त्वाची आहेत. मानवी जीवनाची सुरुवातच विंध्य पर्वतात झाली. तो सुरुवातीला या पर्वतावर अशाच गुहेमध्ये समूहा-समूहाने राहत होता. तेथून हा मानव पर्वता पर्वतावरून सातपुडा पर्वतावर आश्रयासाठी आला. आपण जगत असलेल्या जीवनशैलीचे टीपण त्याने चित्रभाषेत करून आपल्या येणार्या पिढीला त्याबाबत अवगत करण्याचा प्रयत्न केला असावा. मानवी अभिव्यक्तीचा हा सर्वात जुना ठेवा म्हणजे मानव उत्क्रांतीच्या अभ्यासकांसाठी एक पर्वणीच आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या महाराष्ट्रासाठी विदर्भातील या गुहाचित्रांचा शोध म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षात लाभलेलं सोनेरी संचितच म्हणावे लागेल. विदर्भाच्या सांस्कृतिक कलेचा हा वारसा संपूर्ण जगाला साद घालतोय. विदर्भाच्या गर्भात लपलेल्या अलौकिकतेची गाथा सांगतोय.
मध्यपुराणाश्मयुग: (Mesolithic Age)
यात
पन्नास हजार ते पंचवीस हजार वर्षांपूर्वीचा सर्वसाधारण काळ येतो. तिसऱ्या
आंतरहिमयुगाचा उत्तरार्ध आणि व्यूर्मची ( Wurm–चौथ्या हिमयुगाची ) सुरुवात,
हे काळ ह्यात समाविष्ट होतात. ह्या काळातील हवामान अतिशीत असल्यामुळे
क्वचित अधूनमधून जंगले आढळत. मात्र ह्या काळात उत्तर यूरोपात खुरट्या
वनस्पतींचा प्रदेश होता. त्यात गुहांच्या आश्रयाने राहणारे केसाळ गवे,
अस्वले, रान- बैल व गेंडे हे मुख्य प्राणी असत.
या काळात यूरोप व पश्चिम
आशिया या भागांत निअँडरथल मानवाची वस्ती होती. तो मुख्यत्वे गुहांतून वा
प्रस्तरालयांतून राहत असे.
त्यांतील काही गुहांतून चित्रकाम सापडले आहे.
मौस्टेरियन (यूरोप) व लीव्हाल्लॉइसो-मौस्टेरियन (पश्चिम आशिया) हे ह्या
काळातील दोन प्रमुख समाजगट होत.
त्यांची हत्यारे लहान आकाराची, वाटोळी पण
धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होती. ती गोरगोटी दगडांच्या छिलक्यांची केलेली
असत. ह्याशिवाय इतर उपकरणांत तासण्या, टोचे, बाणांच्या टोकासारखे लहान
हत्यार यांचाही समावेश असे.मध्याश्मयुगाचा काळ ४०,००० वर्षांपूर्वीचा आहे, हे आता कार्बन कालनिर्णयानुसार सिद्ध झाले आहे.
मध्याश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :- १)पुराश्मयुगीन थंड हवामानात बदल होऊन मध्याश्मयुगात हवा उबदार बनली. त्यामुळे या काळातील हत्तीसारखे मोठे प्राणी नाहीसे होऊन चपळ व आकाराने लहान प्राणी अस्तित्वात आल्याने या मानवाला शिकारीच्या तंत्रात बदल करावा लागला. त्यांनी सूक्ष्म आणि भूमितीजन्य आकाराची हत्यारे बनवली.यालाच 'सूक्ष्मास्त्रे' म्हणतात. सूक्ष्मास्त्रे (microliths) ही मध्याश्मयुगाची प्रमुखवैशिष्ट्ये आहेत.
२)या काळातील हत्यारांमध्ये हातकु-हाडी, वेधण्या, तासण्या, तीराग्रे, टोकदार हत्यारांचा समावेश होतो.
३)मध्याश्मयुगाच्या शेवटच्या काळात शेतीचा शोध लागला.
४) मृदभांड बनवण्याची कला या मानवाने अवगत केली.
५)या काळातील मानव पशुपालन करू लागला.
६)मानवाला याच काळात अग्नीचा शोध लागला. ७) या काळातील हत्यारे ही ज़स्पर, चर्ट, एगट अशा दगडांची बनवली जाऊ लागली.
८)शिकारीसाठी व संरक्षणाच्या सामूहिक भावनेतून हा मानव टोळी करून राहू लागला.
९)गाय, बैल, म्हैस, घोडा, शेळी, मेंढी यांची या काळात शिकार केली जाई.
१०)पुरलेल्या मृताजवळ सापडलेल्या दैनंदिन वापरातील भांडी व हत्यारांवरून त्या काळातील मानवाचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे दिसून येते.
११)नेवासे, नांदेड, जळगाव व गोदावरी नदीच्या खो-यात या काळातील हत्यारे सापडली आहेत.
आदिमानवाच्या काळातही ‘मुंबई’ शहरात होते कारखाने!
मुंबई शहर हे अश्मयुगीन काळातदेखील कारखाने आणि फॅक्ट्री साईटसाठी वापरात असल्याची अतिशय रंजक माहिती आज आपण पाहणार आहोत. मुंबईतील कोणत्या भागात आदिमानवाचे वास्तव्य होते पाहा.
मुंबई आणि अश्मयुग यांच्यातील संबंध पाहा.
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास म्हटला की अर्थातच आदिमानव ते सध्याचा प्रगत मानव इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास, प्रवासादरम्यान मानवाने स्वतःच्या संरक्षणासाठी, पोटापाण्यासाठी कोणकोणते शोध लावले हे पाहणे फार महत्त्वाचे असते. हे केवळ महत्त्वाचे नसून, अतिशय रंजक असे आहे. मानवाच्या उत्क्रांतीचे तीन महत्त्वाचे टप्पे, कालखंड म्हणजे अश्म्युग, ताम्रयुग आणि लोहयुग. सर्वात पहिले युग म्हणजे अश्मयुग.
मुंबई शहर हे अश्मयुगीन काळातदेखील कारखाने आणि फॅक्ट्री साईटसाठी वापरात असल्याची अतिशय रंजक माहिती आज आपण पाहणार आहोत. मुंबईतील कोणत्या भागात आदिमानवाचे वास्तव्य होते पाहा
मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास म्हटला की अर्थातच आदिमानव ते सध्याचा प्रगत मानव इथपर्यंतचा संपूर्ण प्रवास, प्रवासादरम्यान मानवाने स्वतःच्या संरक्षणासाठी, पोटापाण्यासाठी कोणकोणते शोध लावले हे पाहणे फार महत्त्वाचे असते. हे केवळ महत्त्वाचे नसून, अतिशय रंजक असे आहे. मानवाच्या उत्क्रांतीचे तीन महत्त्वाचे टप्पे, कालखंड म्हणजे अश्म्युग, ताम्रयुग आणि लोहयुग. सर्वात पहिले युग म्हणजे अश्मयुग ! नावाप्रमाणेच अश्मयुगात मानव / आदिमानव हा स्वतःच्या रक्षणासाठी दगडांपासून हत्यारे, अवजारे, त्या काळातील जीवनोपयोगी वस्तू तयार करत असे; असे आपण अगदी लहानपणापासून शाळेत शिकत आलो आहोत. मात्र, त्या काळातदेखील मुंबई शहरात, या आदिमानवाचे हत्यार बनवण्याचे कारखाने थाटले असल्याची रंजक माहिती तुम्हाला माहीत आहे का? चला मग, आज आपण या दोघांमधील संबंधाची माहिती जाणून घेऊ.
मुंबई शहरात गोराई भागात असणाऱ्या मनौरी किनाऱ्यालगत आदिमानव आणि त्यांच्या दगडी अवजारांचे काही अवशेष / पुरावे २०१७ साली काही पुरातत्वीय शास्त्रज्ञांना सापडले असल्याची माहिती गोष्ट मुंबईची या यूट्यूब मालिकेतून आपल्याला समजते. मुंबई विद्यापीठाच्या बहिःशाल शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारे सेंटर फॉर आर्किओलॉजी, साठ्ये महाविद्यालय आणि इंडिया स्टडी सेंटर हे मुंबईच्या संशोधन प्रकल्पावर काम करत होते. यासाठी त्यांना भारतीय पुरातत्त्व खात्याने [ASI] देखील परवानगी दिली होती. तेव्हा २०१७ साली याच मनौरी किनाऱ्याजवळ अश्म हत्यारांचे पुरावे सापडल्याचे समजते.
सुरुवातीला एक, दोन हत्यारे सापडता-सापडता संशोधकांना अनेक दगडी हत्यारे या ठिकाणी सापडली. त्यामुळे मुंबईतील या भागात त्या अश्मयुगीनकाळी आदिमानवांची हत्यारांची फॅक्टरी असल्याचा अंदाज लावला होता. जेव्हा एखाद्या वस्तूची सर्वाधिक गरज निर्माण होते, तेव्हा ती वस्तू मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते आणि अशा ठिकाणालाच आपण फॅक्टरी असे म्हणू शकतो. मात्र, कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना, अश्मयुगीन काळात आदिमानव हत्यार आणि शस्त्रे कशी बनवत असतील?
अश्मयुगीन मानव हत्यारे कशी बनवत होते?
तर त्याकाळातील मानव, गोल आकाराच्या आणि विशिष्ट पकड असणाऱ्या दगडाचा वापर करत असे. या दगडांना हॅमर स्टोन असे म्हटले जाते. या बेसॉल्टिक हॅमर स्टोनचा वापर, मोठे दगड फोडून, त्यांमधून हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे. मात्र, हे दगड फोडण्यासाठीदेखील एक विशिष्ट पद्धत आहे. जो दगड फोडायचा आहे, त्यावर हॅमर स्टोनने ४५ अंशाच्या कोनामध्ये प्रहार केले जातात. असे केल्याने दगड फोडला जातो. आता त्यांना योग्य आकार देण्यासाठी, लहान आकाराच्या हॅमर स्टोनचा उपयोग केला जातो. अशा पद्धतींचा अभ्यास करून, संशोधकांना तयार झालेली हत्यारे मानवनिर्मित आहेत की नाही हे समजण्यास मदत होते. तसेच ते कसे तयार केले गेले आहेत तेसुद्धा त्यांना समजते.
असे हे हॅमर स्टोन, हत्यारे बनवण्याची अवजारे मनौरीच्या वनडोंगरी भागात भरपूर प्रमाणात सापडत असल्याने संशोधक या जागेला अश्मयुगातील फॅक्टरी साईट म्हणतात. तोसाबंता पधान [Tosabanta Padhan] या पुरातत्त्व शास्त्रज्ञाचा अभ्यासाचा मुख्य विषय हा अश्मयुगीन हत्यारे असा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मनौरी भागात हे प्रायोगिक उत्खनन करण्यात आले होते. तेव्हा तिथे सापडलेली हत्यारे लॅबमध्ये नेऊन त्यावर अभ्यास केल्यावर असे समजले की, मुंबईतील मनौरी भागात सापडलेली ही हत्यारे मध्याश्म युगातील होती. म्हणजे साधारणतः १७ हजार वर्षे जुनी.
याव्यतिरिक्त एकोणीसशेच्या काळात, कर्नल टोड यांनीदेखील या हत्यारांचा शोध घेतला होता. तेव्हा त्यांना मनौरी, मढ, गोराई यांसारख्या ठिकाणी अश्म हत्यारांचे अवशेष सापडले होते. हत्यारं आणि शस्त्रांव्यतिरिक्त चौथ्या आणि पाचव्या शतकातील रोमन साम्राज्यातील वाईन साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भांड्यांचे अवशेषदेखील याच मनौरीमध्ये सापडले आहेत.
खानदेशातील मध्य पुराश्मयुग
पुर्व पुराश्मयुगीन खानदेशातील
दुसरे स्थान म्हणजे भाडणे हे होय. हे धुळे जिल्ह्यातील कान नदीच्या काठावर
साक्री तालुक्यातील आहे. कान ही पांजरा नदीची उपनदी आहे, पांजरा तापी नदीची
उपनदी आहे. एस.ए. साळी यांनी १९७८ मध्ये या स्थळाचा शोध लावला आणि बारा
मीटर उंचीचे चार गाळाचे ढिगारे बघितले. तीन वेगवेगळ्या थर असलेली होय. तिथे
सापडलेली अश्युलियन अवजारे सर्वात खालच्या थरात सापडली ती बरीच सुस्थितीत
होती आणि बसाल्ट आणि डोलेराइट या दगडापासून बनवलेले आहेत.
महाराष्ट्रातील
महत्त्वाचे स्थळ ज्यापासून पुर्व पुराश्मयुगीन अभ्यास सुरू झाला ते म्हणजे
गोदावरी नदीच्या खोऱ्यातील चिरकी नाला जो प्रवरा नदीच्या काठावर आहे.
नेवासा जे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण आहे. याशिवाय मध्य पुराश्मयुगातील
रनाळे आणि रायगड ही तापीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाच्या
फॅक्टरी साईट आहे, येथे ताच्येलाईट लाल रंगाची बारीक बसाल्टचा वापर केला
आहे.
खानदेशातील मध्य पुराश्मयुग
हा काळ पुर्व
पुराश्मयुगाचाच सलग असतो, या काळातील भारतीय अवजारे ही आकाराने लहान,
उत्कृष्ठ पोताची दगड वापरलेली, बारीक बारीक छिलके काढून संस्कार केलेली
आढळून येतात, त्याचे प्रकार म्हणजे तासण्या, नोक हत्यारे, क्षुद्र छिन्नी
किंवा उत्किर्णक होय. या काळात अवजारे ही छिलक्यापासून बनवली जात आणि
निअंडरथल मानव अस्तित्वात होता.
मध्यपुराश्मयुगातील मानव
युरोपातील उपलब्ध पुराव्यानुसार समाज निर्माण झाल्याचे दिसून येते. या
काळात हवामान अत्यंत थंड असल्याने तत्कालीन मानवाला झोंबणार्या गार
वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी उघड्यावर राहण्याऐवजी नैसर्गिक मध्ये किंवा
नैसर्गिक सारखा पुढे आलेल्या खडकाचा आश्रय घेऊन राहावे लागले आणि अनेक गट
एकत्र आल्याने कदाचित निरनिराळ्या गटांमध्ये एकत्र समाजाची भावना निर्माण
झाली असावी. कदाचित प्राथमिक कुटुंब संस्थेचा उगम झाला असावा आणि या
भावनेतूनच मृत व्यक्तीचे अत्यंत काळजीपूर्वक करण्याची प्रथा या काळात
प्रचलित झाली असावी. कुटुंबसंस्थेतूनच मग प्रेम भावना निर्माण होते आणि
त्यामुळे हे प्रेम मृत्यूनंतरही कायम टिकावे म्हणून काळजी घेतली जाते. या
काळात फ्रान्स, चीन, पॅलेस्टाईन येथील लहान मुलांची अत्यंत काळजीपूर्वक
केलेली दफने साक्ष देतात. त्या काळात आकाराने लहान परंतु अत्यंत
काळजीपूर्वक व रंगीबेरंगी दगडांची केलेली अवजारे आढळतात.
मध्यपुराश्मयुगात
युरोप मधील मानव नैसर्गिक गुहा तसेच शैलाश्रयाने रहात होता, चीनमधील
चौकुतीन गुहांमध्ये मानवी कुटुंब एकत्र रहात असल्याचे दिसून येते.
१९५४
साली सांकलिया यांनी पहिल्यांदा प्रवरा गोदावरी नदीच्या खोऱ्यात तासण्या,
तिराग्रे आणि वेधण्या आढळून आले. विशेषतः खालील बाबींचा समावेश याकाळाचा
अंदाज घेण्यासाठी केला जातो. अर्थातच हा टप्पा पुर्वपुराश्मकाळ आणि उत्तर
पुराश्मकाळातील आहे. कुठल्या प्रकारचे अवजारे सापडतात? ते बनवण्याचे तंत्र
काय होते? काही स्थळांवर समध्वय दिसतो का? अर्थातच तुलनात्मक अभ्यास,
अवजारांचा वापर कशासाठी होत होता? काय मटेरीयल वापरलेले आहे. ? स्तरवार
उत्खननात कोणत्या थरात सापडली आहेत? स्थळांचा प्रकार काय आहे? नदीच्या
खोऱ्यात, फक्टरी साईट, डोंगरावर की सपाट जमीनीवर होय. त्या स्थळावरील
त्याकाळातील पर्यावरण काय होते? त्याचा मानवी जीवनात काय परिणाम झाला वगैरे
वगैरे.
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात ठिकाणी झालेल्या
अभ्यासातील रेडीओ कार्बन कालमापन पध्दतीने काळ इसवीसन पुर्व ४०,०००-१०'०००
एवढा मोठा आहे. या साठी पाण्यातील शिंपले, अर्ध कार्बनाईज झालेले लाकुड आणि
हाडे हे मटेरीयल वापरलेले आहेत. थर्मोल्युसन्स आणि युरेनियम/ थोरीयम
पध्दतीने काढलेल्या काळाचा तारखा राजस्थान येथील मध्य पुराश्मयुग १,५०,०००
ते १००,००० एवढा येतो. महाराष्ट्रातील चिरकीनाला प्रवरा अहमदनगर जिल्हा,
वाडोलीवाघोली हे गोदावरी नदीच्या खोऱ्यातील औरंगाबाद जिल्हा, पाटणे आडनाला
जळगाव जिल्ह्यातील, महाराष्ट्रात प्रातिनिधिक समजले जाणारे म्हणजे नेवासा
आणि पाटणे ही दोन स्थळे आहेत.
कार्बन २४ या कालमापन पद्धतीच्या
सहाय्याने पूर्व पुराश्मयुगाचा भारतातील काळ निश्चितपणे आज पासून एक लक्ष
वर्ष एवढा होता, काही ठिकाणी तो १४ लक्ष तसेच त्याच्याही मागे जाण्याची
सुद्धा शक्यता आहे. भुगर्भ शास्त्राच्या परिभाषेत तो पूर्व ते मध्य
प्लायस्टोसीन युगा इतका आहे तर मध्य पुराश्मयुगाचा काळ हा मध्यप्लायस्टोसीन
ते उत्तर प्लायस्टोसीन म्हणजे आज पासून एक लाख वर्ष पूर्व ते ४० हजार वर्ष
पूर्व एवढा होतो. या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे बदल घडून आले
असे भूगर्भ शास्त्रज्ञ मानतात. पृथ्वी दुसऱ्या अंतरहिमाचा अनुभव घेत होती
असे दिसते. पर्यावरणात झालेल्या या फरकामुळे मात्र प्रत्यक्षात जीवसृष्टी
आणि हवामान यात फरक पडलेला दिसत नाही.कदाचित तेव्हापासून मानवाच्या
मेंदूमध्ये अधिक प्रगल्भता निर्माण झाली असल्यामुळे त्यांची हत्यारे प्रगत
तंत्राची आणि जास्त कौशल्यपूर्ण अशी होती. मोठ्या आकाराच्या हात कुऱ्हाड
किंवा त्यांच्या अभावी मध्यपुराश्मयुगात मानवाने कठीण दगडाचा जास्त सुबक
तंत्रान घडवलेल्या तासण्या, बाणांची टोके, गिरमिटे, पाती, चाकु इत्यादींचा
अंतर्भाव असलेले प्रभावी हत्यारे तयार केली. या हत्यारांचे वैशिष्ट्य असे
होते की लहान-लहान घडवलेल्या चिपा एका मोठ्या लाकडाच्या अथवा हाडाच्या
खोबणीत बसवून त्यापासून त्याचे एक मोठे हत्यार तयार केलेले दिसते. दुसरे
असे की अवजडपणा जाऊन आकारात सुटसुटीतपणा आल्याने हत्यारांचा पल्ला वाढला
आणि त्याच्यात अचूकता आली आणि ती अधिक परिणामकारक रित्या शिकार करण्यासाठी
वापरता आली. जनावरांच्या कळपात पिटाळत नेऊन उंच ठिकाणावरून खाली हाकलत
पाडून मारण्याच्या शिकारीच्या तंत्राबरोबरच परिणामकारक रित्या प्राणी किंवा
पक्षी यांचे यशस्वी शिकारी तंत्र मानवाने आत्मसात केले, या दगडाच्या उपयोग
बनवण्यासाठी उपयोग झाला.
पुरातत्त्वज्ञ एस ए. साळी यांच्यामते
मध्यपुराश्मयुगाचे सुरुवातीच्या काळात जे काही भूगर्भातील प्रचंड
स्थित्यंतरे ज्याला टेक्टनिक मोवहमेंट्स म्हटले जाते. त्याचे परिणाम तापी
खोऱ्यात ही झाले. आणि त्याच काळात पाटणाच्या दक्षिणेला अजिंठा डोंगराच्या
पायथ्याशी एक खोलगट भाग तयार झाला. अनेक दृष्टीने सुरक्षितता लाभलेल्या या
भागात चाळीस हजार वर्षापासून म्हणजे मध्य पुराश्म काळात च्या शेवटच्या
काळापासून ते उत्तर पुराश्म काळात या भागात मानव वस्ती करून राहू लागला. या
युगातील मानवी वसाहतींचे पुरावे दर्शवणारे पाटणे हे एक स्थान आहे. या
काळातील पाषाण आयुधे ही पाटणे येथे सापडली आहेत.
मध्य
पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग आणि मध्याश्मयुगात म्हणजे काळात या भागात
महत्त्व आहे. या उत्खनन स्थानामध्ये पाटणे विशेष महत्वाचे आहे. पाटणे
अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी तीन बाजूंनी डोंगर कडा असलेल्या वर्तुळाकार
दीर्घ नाट्यशाळे सारख्या खोऱ्यात आहे. या भागातील भुस्तरात कंकर म्हणजे दगड
गोटे, गाळ, वाळू व मातीचा अंदाजे १० ते २० मीटर थर आहे. या थरात एस.ए.
साळी यांनी दोन वेळा उत्खनन केले. त्यात त्यांना भुविज्ञानविषयक तेरा थर
आढळले. त्यात सर्वात खालचा थर हा मध्य पुराश्म युगातील असून त्यातील आठ थर
उत्तर पुराश्म युगातील आहे. सर्वात वरचे चार थर हे मध्याश्मयुगातील
असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर पुराश्म युगातील आठ थरांची जाडी एकूण ५.५
मीटर असून क्रमांक पाच आणि सात वर मानवनिर्मित कला वस्तूंची समृद्ध आहेत
आणि त्यांच्यात अनुक्रमे ११,७८८ आणि १२३०३ एवढे विविध नमुने आढळले आहेत,
तसेच उत्तर पुराश्म युगातील शहामृगाच्या अंड्यांची शंभराहून अधिक नमुने
सापडले आहेत. त्यातील तीन नमुने उत्तर पुराश्म युगातील असून अंड्याच्या
कवचावर जाळीची नक्षी दिसून येते. या ठिकाणी शहामृगाच्या अंड्यापासून
बनवलेले तीन चपटे मणी आणि नदीच्या मुखाजवळील प्रदेशात शंखा पासून बनवलेल्या
मण्यांचेही नमुने सापडले आहेत. ते उत्तर पुराश्म युगातील आहे, या काळातील
मानवी कलावंत एकत्रित वसाहत करून रहात असल्याचा सर्वात मोठा आधीचा पुरावा
मानला जातो.
मध्य पुराश्म युगातील अणुकुचीदार हत्यारांचा वापर
मानवाच्या सुरुवातीच्या अवस्था दाखवतो. उत्तर पुराश्म युगातील काळात मानव
जा स्वर दगडापासून हत्यारे बनवी तर याच काळातील नंतरच्या काळात मानव म्हणजे
पांढरा चकचकीत दगड किंवा गार यापासून हत्यारे बनू लागला. नंतरची हत्यारे
त्याच्या अर्धचंद्राकार, विषम, चतुर्भुज व त्रिकोणी आकारावरून ओळखता येतात.
या भागात मध्य पुराश्मयुगा पासून ते मध्याश्मयुग म्हणजेच मेझोलिथिक काळा
पर्यंतचे भूस्तर विज्ञान विषयक मानवी अवशेषांचे स्पष्ट पुरावे आढळून
आल्याने पाटणे स्थानास असाधारण महत्त्व प्राप्त झाले. मध्य पुराश्म व उत्तर
पुराश्मयुगामधील अवशेषांप्रमाणेच त्यानंतर येणारी अवस्था म्हणजे मध्याश्म
युगातील जे मेझोलीथिक कल्चर म्हटले जाते,त्याचेही पुरावे पाटणे येथे मिळाले
आहे. मध्याश्मयुगाचेही तीन कालखंड मानले जातात. असे पाच कालखंड साळी यांनी
पाटणेच्या संदर्भात मांडले आहे. अर्थातच हे उत्तर पुराश्मकाळानंतरचे होय.
पहिला
कालखंड हा उत्तर पुराश्मकाळानंतरच्या काळात यात विविध प्रकारच्या पाती आणि
विविध टोकांची अश्मयुगीन हत्यारे सापडतात. दुसरा कालखंडात बरेच बदल दिसून
येतात, यात कोळशांचे बारीक तुकडे आणि भाजलेल्या मातीचे पुरावे दिसतात तर
शेकोटी आणि स्तंभछिद्रांचे अस्तित्व दिसते. वाऱ्याने उडून आलेल्या मातीतील
निक्षेपात भुस्तरावरील भाजक्या विटांसारखे पट्टेही दिसतात.
तिसऱ्या
कालखंडात मध्याश्मयुगातील तीनही कालखंड पाटणे येथे दिसतात. एकंदर आद्य
पुराश्मयुग इसवी सन पूर्व दिड लाख वर्षे ते एक लाख वर्षांपूर्वी, मध्याश्म
पुराश्मयुग इसवी सन पूर्व एक लाख ते तीस हजार वर्षे आणि उत्तर पुराश्मयुगात
इसवी सनपूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष, मध्याश्मयुग इसवी सन पूर्व दहा
हजार ते चार हजार वर्षे आणि नवाश्मयुग इसवी सन पूर्व चार हजार ते दोन हजार
सातशे वर्षे अशा या पाच अवस्था आहेत. पाटणे भागात उत्तर पुराश्म युगातील
म्हणजे तीस हजार वर्षापूर्वी मानवी वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत
म्हणूनच पुरातत्त्वज्ञ एस.ए. साळी यांच्या मते तीस हजार वर्षाच्या काळात
हवामानात विषयक महत्त्वाचे बदल घडून आले नसले तरी परिस्थितीत निश्चित बदल
होत गेले आणि नदीला त्यांनी वाहून आणलेला गाळ पसरून मैदानी भाग तयार झाला.
गवत आणि वनस्पती उगवल्या, हत्यारे तयार करण्यासाठी गारांचे दगड त्या खडकात
मुबलक उपलब्ध होते. नदी नाल्यात काही ठिकाणी डोह निर्माण झाले. मैदानी
प्रदेशात गवताळ भागात शहामृग तसेच मोरासारखे मोठे पक्षी व घोडे यांसारखे
प्राणी राहत. अशा परिस्थितीत सातमाळा डोंगराच्या पायथ्याशी मानवाने आपले
गावठाण स्थापन केले, या पाच अवस्था वरून हळूहळू कसा विकास होत गेला हे
लक्षात येते.
( एस. ए. साळी यांनी रघुनंदन या चाळीसगाव येथील
मासिकात " पाटण्यातील मानवी जिवनाची तीस हजार वर्षे" १९८८ मधील लेखात
सविस्तर लिहिले आहे. तसेच "दि अप्पर पॅलिओलिथिक कल्चर ऑफ पाटणे, डिस्टिक
जलगाव, महाराष्ट्र" यालेखात तसेच "रिसेंट ॲडव्हान्सेस इन इंडो पॅसिफिक
हिस्टरी, १९८५, या लेखात आर. एस. पप्पू यांनी लिहिले आहे. "स्टोन कल्चर ऑफ
महाराष्ट्र" महाराष्ट्र स्टेट गॅझेट मध्ये तर, हिस्टरी: एन्शंट पिरीयड, यात
तोकडीच माहिती आहे असे म्हणायला हरकत नाही. पुरातत्त्वज्ञ साळी यांनी या
भागात १९७१ ते १९७५ असे दोन वेळा उत्खनन करून सलग तेरा वर्षे संशोधन केले
आहे.)
धार्मिक रचनांचा एक वेगळा प्रकार म्हणजे विविध दगडी शिल्पे ( ओल्होव्स्की, २००५ ). हे एकतर प्रतिमांचे कोणतेही चिन्ह नसलेले साधे दगड असू शकतात किंवा लोक, देव किंवा संपूर्ण मिथकांचे चित्रण करणारी जटिल शिल्पे असू शकतात ( आकृती ८ ). यापैकी काही दगड दफनविधींशी संबंधित असू शकतात, परंतु बहुतेक भागांसाठी ते पूजेचे वस्तू आहेत आणि कदाचित, धार्मिक स्थळांशी संबंधित आहेत. अशा शिल्पांचे एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे "हरण दगड", जे युरेशियन स्टेप आणि लगतच्या पर्वतीय प्रणालींमध्ये आढळतात ( सॅव्हिनोव्ह, १९९४ ; व्होल्कोव्ह, २००२ ). बहुतेकदा, ते व्यक्ती आणि त्यांच्या कपड्यांचे घटक (पट्टा), दागिने (लौकिक अंगठ्या, हार) आणि लष्करी पोशाख (खंजीर, चाकू, पंचियन, कुऱ्हाड, धनुष्य इ.) योजनाबद्धपणे दर्शवतात. चेहरा सहसा अनेक तिरकस रेषांनी दर्शविला जातो आणि दगडावरच प्राण्यांच्या असंख्य प्रतिमा असू शकतात, प्रामुख्याने हरण, ज्यामुळे या विशेष स्टीले गटाला हे नाव मिळाले. ते उत्तरार्धातील कांस्य युग आणि सुरुवातीच्या सिथियन काळातील आहेत. जटिल प्रतिमा असलेले दगडी स्टीले बसवण्याच्या आणखी प्राचीन परंपरा आहेत. उदाहरणार्थ, ते मध्य येनिसेईच्या ओकुनेव्हो संस्कृतीत आणि उत्तर काळ्या समुद्राच्या प्रदेशातील यमनया संस्कृतीत व्यापक आहेत ( लेओन्टीव्ह एट अल., २००६ ).
Menhirs may be found singly as monoliths, or as part of a group of similar stones.
They are widely distributed across Europe, Africa, and Asia, but are most numerous in Western Europe.
Their size can vary considerably; but their shape is generally uneven and squared, often tapering towards the top.
Often menhirs were placed together, forming circles, semicircles, or vast ellipses.
Megalithic menhirs were also placed in several parallel rows, called alignments. The most famous of these are the Carnac, France, alignments, which include 2,935 menhirs.
They are sometimes engraved with abstract forms (line, spiral) or with objects’ images like axes.
Identifying the uses of menhirs remains speculation. However, it is
likely that many uses involved fertility rites and seasonal cycles.
Q1: What is the Iron Age?
The Iron Age was a period in human history that started between 1200
B.C. and 600 B.C., depending on the region, and followed the Stone Age
and Bronze Age. The Iron Age existed in Africa, Europe, and Asia during
prehistoric times in the Old World. The Iron Age did not occur in
America because this was the New World and had not yet been discovered.
People discovered iron at this time. It quickly became the preferred
choice of metal, replacing the use of bronze in metalworking. The use of
iron brought important changes to people’s lives.
Chennai:
In August 2019, a team of history enthusiasts had identified three
prehistoric menhirs, dating between 1500 to 500 BC, on a private land in
Anjur near Muthur in Erode district. Although the state archaeology
department was informed about it, there was no response. On Friday, when
the team revisited the place, it found that one of the menhirs in Anjur
has been reduced to pieces.
“The menhir is destroyed. We don’t
know if someone has deliberately done it or it happened due to natural
causes, ” said Sakthi Prakash, a member of the team that identified the
menhirs seven months ago. It was while conducting a survey as part of
their documentation project on hero stones and menhirs that a team
comprising Sakthi Prakash, S Veludharan, K Srinivasan and John Peter of
the Kongu region found the menhirs lying neglected. All the three
menhirs, one at Thindal and two at Anjur, near Muthur were not offered
worship. A menhir is a single prehistoric standing stone commonly found
near the ancient burial sites or chambers. The exact role of menhirs is
yet to be identified by researchers. The word menhir is of Celtic origin
men ‘stone’ and hir ‘long’. The menhirs in Erode attain significance as
the sites lie near Kodumanal, a prehistoric site. The menhir located in
Thindal was 14-foot-tall and 5-foot-wide, while the two menhirs found
in Anjur were 9-foot-tall each. “One of the menhirs found in Anjur has
been destroyed, but the other one has not faced any threat so far. The
local people don’t know the significance of menhirs and they think they
are just remains of a huge rock. We have time to protect the two if the
state archaeology department gets into action immediately,” she said.
Archaeologists differ when it comes to the role of menhirs in the life
of prehistoric human beings. While some say they are closely related to
the burial rituals as many are found with dolmens, others believe that
menhirs were erected to protect the frontier. K T Gandhirajan, who
discovered many prehistoric rock art paintings across Tamil Nadu, says
the Kongu region of Tamil Nadu has a lot of menhirs. “The non-worshiping
menhirs found in Tamil Nadu are under threat due to vandalism and
urbanisation. Those under worship are safe at least. At some places
people worship the menhir as ‘vedan samy’ (hunter god). If immediate
care is not taken, the vandals or the real estate people may break them
into pieces soon,” he says. Even though one of the menhirs in Anjur has
been reduced to pieces, Sakthi wants the state government to preserve at
least the remains of it. “The pieces of it should be preserved and if
possible be displayed at a museum with the photographs taken before its
destruction. It will create awareness about this prehistoric piece of
art,” she said.
चर्चा में क्यों
तेलंगाना के नारायणपेट जिले में स्थित मुदुमल मेगालिथिक मेनहिर राज्य का दूसरा यूनेस्को विश्व धरोहर स्थल नामित किया गया है।
मेनहिर के बारे में
परिचय :मेनहिर एक सीधे खड़े पत्थर की संरचना होती है, जो आमतौर पर ऊपर से पतली और आकार में बड़ी होती है।
यह मानव निर्मित संरचना हैं, अर्थात इन्हें मनुष्यों द्वारा गढ़ा और स्थापित किया जाता है।
विशालतम : सबसे
बड़ा उपस्थित मेनहिर फ्रांस में स्थित, ग्रैंड मेनहिर ब्रिस है। अपनी मूल
स्थिति में यह 20.6 मीटर लंबा था, वर्तमान में यह चार टुकड़ों में टूट गया
है।
नामकरण : 'मेनहिर' शब्द ब्रिटोनिक ‘माएन’ (maen) से लिया गया है जिसका अर्थ है ‘पत्थर’, और ‘हिर’ (Hir) जिसका अर्थ है ‘लंबा’।यह शब्द 18वीं शताब्दी के अंत में पुरातात्विक शब्दावली में शामिल हुआ।
इसका पहली बार प्रयोग फ्रांसीसी सैन्य अधिकारी और पुरातत्वविद् थियोफाइल कोरेट डे ला टूर डी' ऑवर्गने ने किया था।
उद्देश्य
मेनहिर या तो अकेले या
प्रागैतिहासिक मेगालिथ के एक बड़े परिसर के हिस्से के रूप में, बड़े पत्थर
की संरचनाओं के रूप में पाए जाते हैं।
यह पत्थर संभवतः औपचारिक कार्यों के लिए इस्तेमाल किए जाते थे।
कुछ संस्कृतियों में इन पर कब्रों के निशान पाए गए, जबकि अन्य कुछ संरचनाएँ खगोलीय उद्देश्यों के लिए उपयोग की जाती थी।
पुरातन महत्त्व
यूरोप में पाए जाने वाले मेनहिर
मूल रूप से बीकर संस्कृति से जुड़े थे, जो नवपाषाण काल के अंत और कांस्य
युग की शुरुआत (लगभग 4,800 से 3,800 ईसा पूर्व) में बनाए गए थे।
वर्तमान में सबसे पुराने यूरोपीय मेनहिर 7,000 ईसा पूर्व के माने जाते हैं।
यूनेस्को द्वारा मान्यता के कारण
मेनहिर हमें आरम्भिक मनुष्यों के जीवन के बारे में जानकारी देते हैं।
यह हमें उन संस्कृतियों को बेहतर
ढंग से समझने में मदद कर सकता है जिन्होंने ऐतिहासिक रिकॉर्ड के लिए कोई
लिखित सामग्री नहीं छोड़ी है।
इन बड़े पत्थरों से न केवल पत्थरों
को तराशने और सटीक स्थानों पर ले जाने के लिए प्राचीन सभ्यताओं की समझ का
पता चलता है, बल्कि उनकी स्थिति की सटीकता हमें बताती है कि हमारे पूर्वज
खगोल विज्ञान और संक्रांति के बारे में कितना जानते थे।
ये हमें इस बात की जानकारी देते हैं कि उन्हें बनाने वाली संस्कृतियों ने दुनिया को कैसे देखा और समझा।
यह भी जानें!
तेलंगाना के मुदुमुल मेनहिर के बारे में
परिचय
तेलंगाना के नारायणपेट जिले में
स्थित मुदुमुल मेनहिर वर्ष 2025 में यूनेस्को द्वारा विश्व धरोहर स्थलों की
अस्थायी सूची में शामिल किए जाने वाले छह भारतीय स्थलों में से एक है।
सूची में शामिल अन्य पाँच धरोहर
स्थल - छत्तीसगढ़ में कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान, कई राज्यों में अशोक
के शिलालेख स्थल, मध्य प्रदेश तथा ओडिशा में चौसठ योगिनी मंदिर, कई
राज्यों में गुप्त मंदिर और मध्य प्रदेश एवं उत्तर प्रदेश में बुंदेलों के
महल-किले हैं ।
संरचना
मुदुमुल में खड़े पत्थरों के
अलावा, गोलाकार संरचनाओं में रखे गए छोटे पत्थर भी हैं और 80 एकड़ की भूमि
पर हज़ारों पत्थर संरेखण में रखे गए प्रतीत होते हैं।
यहाँ 10 से 14 फीट की ऊँचाई वाले
लगभग 80 लंबे मेनहिर हैं, साथ ही प्राचीन समुदाय के अंतिम संस्कार अधिकारों
से संबंधित लगभग 3,000 संरेखण पत्थर हैं।
इन पत्थरों को 20-25 फीट के अंतराल पर पंक्तियों व्यवस्थित किया गया है।
महत्त्व
तेलंगाना के मुदुमल में लगभग 3,500 से 4,000 ईसा पूर्व के पाए जाने वाले मेनहिर भारत में सबसे पुराने ज्ञात मेनहिर हैं।
मुदुमल मेनहिर संभवतः दक्षिण भारत में महापाषाण युग के सबसे बड़ा दफन स्थल है।
मुदुमल मेनहिर स्थानीय किंवदंती के साथ निकटता से जुड़ा हुआ है। इसकी देवी येल्लम्मा के रूप में पूजा की जाती है।
यूनेस्को डोजियर में मुदुमल साइट को महापाषाण खगोलीय वेधशाला के रूप में वर्णित किया गया है।
मेनहिर हे एकटे मोनोलिथ म्हणून किंवा समान दगडांच्या गटाचा भाग म्हणून आढळू शकतात .
ते युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये मोठ्या प्रमाणात वितरित केले जातात , परंतु पश्चिम युरोपमध्ये त्यांची संख्या सर्वाधिक आहे.
त्यांचा आकार बराच बदलू शकतो; परंतु त्यांचा आकार सामान्यतः असमान आणि चौरस असतो, बहुतेकदा वरच्या दिशेने निमुळता होतो.
बहुतेकदा मेनहिर एकत्र ठेवले जात असत, ज्यामुळे वर्तुळ, अर्धवर्तुळ किंवा विशाल लंबवर्तुळ तयार होत असे.
मेगालिथिक मेनहिर अनेक समांतर ओळींमध्ये देखील ठेवलेले होते, ज्यांना अलाइनमेंट म्हणतात . यापैकी सर्वात प्रसिद्ध कार्नाक, फ्रान्स, अलाइनमेंट आहेत , ज्यामध्ये २,९३५ मेनहिर समाविष्ट आहेत.
ते कधीकधी अमूर्त आकारांनी (रेषा, सर्पिल) किंवा अक्षांसारख्या वस्तूंच्या प्रतिमांनी कोरलेले असतात.
मेनहिरच्या वापराची ओळख पटवणे हा अजूनही एक
अंदाज आहे. तथापि, असे दिसून येते की अनेक उपयोगांमध्ये प्रजनन संस्कार आणि
ऋतू चक्रांचा समावेश होता.
प्रश्न १ : लोहयुग म्हणजे काय?
लोहयुग हा मानवी इतिहासातील एक काळ होता जो
प्रदेशानुसार इ.स.पू. १२०० ते इ.स.पू. ६०० दरम्यान सुरू झाला आणि त्यानंतर
पाषाणयुग आणि कांस्ययुग आले. जुन्या जगात प्रागैतिहासिक काळात आफ्रिका,
युरोप आणि आशियामध्ये लोहयुग अस्तित्वात होते. अमेरिकेत लोहयुग घडले नाही
कारण ते नवीन जग होते आणि अद्याप त्याचा शोध लागला नव्हता. यावेळी लोकांना
लोह सापडला. धातूकामात कांस्य वापरण्याची जागा घेऊन ते लवकरच धातूचा
पसंतीचा पर्याय बनले. लोहाच्या वापरामुळे लोकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल
घडले.
प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ? - BBC News मराठी
12–15 minutes
प्रियजनांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृती जपणारी आगळीवेगळी परंपरा, काय आहे यामागचा अर्थ?
फोटो स्रोत, harshit charles
Author, शताली शेडमाके
Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"माझ्या
वडिलांची विमानात बसण्याची खूप इच्छा होती. पण त्यांना कधी बसता आलं नाही.
पण मृत्यूनंतर त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्या
वडिलांच्या कलबंडावर मी हे हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी जात आहे."
कलबंडावर (स्मृतिस्तंभावर ) हेलिकॉप्टर घेऊन जात असणाऱ्या व्यक्तीने मला हे सांगितलं.
आपल्या प्रियजनांच्या आठवणींमध्ये कलबंडावर म्हणजेच स्मृतिस्तंभावर अशा अनेक गोष्टी ठेवल्या जातात.
वेगवेगळ्या
संस्कृतींमध्ये मृत व्यक्तींचं स्मरण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती परंपरा
आहेत. सर्व जातिधर्मात आपल्या पूर्वजांची आठवण ठेवली जाते.
आदिवासी
संस्कृतीमध्ये व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची आठवण म्हणून दगडाचे स्तंभ
उभारले जातात. हे स्मृतिस्तंभ आदिम संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील माडिया-गोंड समाजात व्यक्तीच्या
मृत्यूनंतर दगडांचे खांब उभारून त्यावर विविध कलाकृतींच्या माध्यमातून
पूर्वजांचे स्मरण करण्याची विशिष्ट परंपरा आहे.
या स्मृतिखांबांना माडिया भाषेत कलबंडा, बडांग उरसाना तर गोंडीमध्ये उरस्कल, कोटेह कल असं म्हणतात.
गडचिरोली
जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा, कोरची
तालुक्यातील गावा-गावांत मोठ्या प्रमाणात हे स्मृतिस्तंभ पाहायला मिळतात.
या स्तंभांची उंची एक फुटापासून तर 10 ते 12 फुटांपर्यंतही असते.
प्रथेचा नेमका अर्थ काय?
आदिवासी
समाजात व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत शरीराला माती दिली जाते. मातीचं शरीर
मातीमध्ये मिसळलं गेलं अशी भावना त्यामागे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील
आदिवासी बहुल भागांत मृत व्यक्तीच्या स्मृतीनिमित्त दगडी स्तंभ उभारले
जातात. ही परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे.
हे दगडरुपी स्तंभ
व्यक्तीच्या वयानुसार लहान-मोठे असतात, कुटुंबातील मोठ्या व्यक्तीसाठी मोठा
दगड तर लहान मुलांसाठी लहान दगड लावतात. तसेच त्या व्यक्तीला समाजात मोठा
मान असेल तर त्यांच्यासाठी तितकाच मोठा स्तंभ उभारतात.
याबाबत
माहिती देताना माडिया समाजाचे पहिले ॲडव्होकेट लालसु सोमा नोगोटी सांगतात,
"मृत व्यक्ती पुरुष असेल तर उंच दगड आणि महिला असेल तर सपाट दगड ठेवतात.
परंतु, काही ठिकाणी महिलांसाठी उंच दगडही उभारतात. मृत व्यक्तीचं समाजातील
कार्य, योगदान जितकं जास्त असेल त्यांचा स्मृतिस्तंभ तितकाच मोठा असतो."
कलबंडा
उभारल्यानंतर सदर व्यक्तीच्या सर्व वस्तू तिथेच ठेवल्या जातात. यात
त्याच्या वापरातील कपडे, खाट, खुर्ची, ताट-वाटी, सायकल, छत्री इत्यादी.
त्या स्तंभाजवळच टाकून दिल्या जातात. तसेच, जर ती व्यक्ती तंबाखू खाणारी
असेल तर तंबाखूची डबी, थोडीशी दारु या गोष्टी तेथे ठेवतात.
फोटो स्रोत, Shatali Shedmake
फोटो कॅप्शन, या स्मृतिखांबांना माडिया भाषेत कलबंडा, बडांग उरसाना तर गोंडीमध्ये उरस्कल, कोटेह कल असं म्हणतात.
लालसु
नोगोटी पुढे म्हणाले, "कलबंडावर व्यक्तीची जन्मतारीख आणि मृत्यूदिन
लिहिण्यात येतं. जुन्या कलबंडांवर तारखा आढळून येत नाहीत. कलबंडावर त्या
व्यक्तीच्या आवडीची वस्तू किंवा प्राणी यांच्या लाकडी प्रतिकृती ठेवल्या
जातात. काही कलबंडावर लाकडी धनुष्य-बाण,चाकू, तलवार, बंदुक, हेलिकॉप्टरही
दिसून येतात. मृत्यूनंतर त्यांचा पुढचा प्रवास सुखकर व्हावा अशी भावना
यामागे असते."
मृत व्यक्तीला पुरलेली जागा म्हणजेच समाधी
आणि स्मृतिस्तंभ वेगवेगळ्या ठिकाणी असतात. गावातील प्रत्येक कुटुंबाचं एक
कलबंडाचं स्थान असतं जिथे घरातील प्रत्येक मृत व्यक्तीचा कलबंडा उभारलेला
असतो. ते एका रांगेत वा वर्तुळाकार आकारात उभारलेले दिसतात, असंही नोगोटी
यांनी सांगितलं.
विविध राज्यात आढळतात स्मृतिस्तंभ
महाराष्ट्रप्रमाणेच
छत्तीसगढ, आंध्र-प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळमध्येही हे स्मृतिखांब
आढळून येतात. आसाम आणि काश्मिरमध्येही हे स्मृतिस्तंभ आढळून येतात.
याबाबत
बोलताना गोंडवाना विद्यापीठातून गोंडी लोकसंस्कृतीवर पीएचडी करत असलेले
शिक्षक नंदकिशोर नैताम म्हणाले, "महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात जुनापाणी
येथे अनेक शिळावर्तुळे आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी
शिळावर्तुळे, स्मृतिस्तंभ पाहायला मिळतात. विविध राज्यांत यांना वेगवेगळी
नावे आहेत. पत्थलगडी, महापाषाण, शिलाप्रकोष्ठ, शिलास्तंभ (Menhir),
शिळावर्तुळे तर इंग्रजीत मेगालिथ (Megalith) असं म्हणतात."
फोटो स्रोत, Nandkishor Naitam
फोटो कॅप्शन, आरमोरी तालुक्यातील आरसोडा येथे 3 हजार वर्षापूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे 97 स्टोन सर्कल वैनगंगा नदीच्या तीरावर आढळले.
नैताम
सांगतात, "आदिवासी भाषांमध्ये कोटेहकल, बडांग उरसाना, बडांग तासना, हातूर
बंडा, हत्तुरकल, उरस्कल, कलबंडा, गाता पाखना अशी नानाविध नावे आहेत. हे
स्मृतिस्तंभ महापाषाण युगीन असल्याने ज्या-ज्या भागात कोयतूर लोक (आदिम
समूह) आहेत त्या-त्या भागात हे स्मृतिस्तंभ मोठ्या प्रमाणात दिसतात."
ही परंपरा का सुरू झाली?
व्यक्तीचा
मृत्यू झाल्यानंतर आत्मा शरीर सोडून निघून जात असली तरी निसर्गात तिचा वास
असतो. त्या आत्मासाठी कलबंडा उभारले जातात आणि त्याच्या सर्व वस्तू देखील
तेथेच ठेवतात.
याबाबत माहिती देताना नंदकिशोर नैताम
सांगतात, "व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ हा दगड उभारला जातो.
मृत व्यक्तीची स्मृती नेहमीसाठी राहावी. भविष्यातील पिढीला आपल्या वंशातील
व्यक्तीची माहिती त्याद्वारे होत राहावी, असा यामागचा उद्देश आहे. गावात
वेगवेगळ्या गोत्रांचे वेगवेगळे उरस्कल स्थान असतात."
भामरागड
तालुक्यातील काही गावातील स्मृतिस्तंभ हे जवळपास 300-400 वर्ष जुने आहेत.
तर, पुरसालगोंदी या गावात जवळपास 20 फुट उंचीचा स्मृतिस्तंभ आढळून आल्याचं
नैताम यांनी सांगितलं.
तर,
भामरागड तालुक्यातील गोंगवड गावच्या जानो शंकर मडकामी म्हणाल्या, "माणूस
मेल्यानंतर दिनाल्क (कलबंडा उभारण्याचा विधी) करुन कलबंडा लावला नाही तर ती
व्यक्ती रुसते मग कुटुंबातील लोक आजारी पडतात. म्हणून दिनाल्क करावाच
लागतो, ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे."
"दिनाल्क
करून कलबंडा लावताना त्या व्यक्तीचे कपडे आणि वापरातील साहित्य तिथेच
टाकतात. त्यांचे कपडे आपल्यासाठी उपयोगाचे नाहीत. माझे कपडे मला नाही दिले,
असं त्या व्यक्तीच्या आत्म्याला वाटायला नको, म्हणून त्याच्या सर्व वस्तू
तिथेच टाकून देतात," मडकामी सांगतात.
फोटो स्रोत, Shatali Shedmake
फोटो कॅप्शन, दिनाल्क करावाच लागतो, ही आमची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे असं जानो मडकामी सांगतात.
दगडाच्या
स्तंभावर पांढरा कापड पांघरतात. तसेच सुरण कांदा, तांदूळ, पैसे आणि मृत
व्यक्ती तंबाखू किंवा दारू पित असेल तर तर त्या स्तंभ जवळ दारु सुध्दा
ठेवतात.
कलबंडावर लाकडी हेलीकॉप्टर, पक्षी, प्राण्याची
शिंग, चाकू, तीरकामठा बनवून घ्यावा लागतो, ते तयार करणाऱ्यालाही एक कोंबडा
आणि बाटलीभर दारू द्यावी लागते.
लग्नात जितका खर्च होतो तितकाच खर्च या कार्यक्रमात होतो, असंही जानो मडकामी यांनी सांगितलं.
फोटो स्रोत, Nandkishor Naitam
फोटो कॅप्शन, या स्तंभांची उंची एक फुटापासून तर 10 ते 12 फुटांपर्यंतही असते.
मृत्यूनंतर
जीवंत आत्मा निसर्गशक्तीत विलीन होते, तर सावली भरकटत असते, ती घरात
प्रवेश करून कोणाला हानी पोहचवू नये, तसेच, पूर्वजांच्या सानिध्यात राहावी,
या दृष्टीने कलबंडा उभारले जातात.
मृत्यूपश्चात ही मंडळी
लोकांच्या नैतिक वर्तनावर लक्ष ठेवते आणि आदिवासी कायद्यांचे उल्लंघन
करणाऱ्यांना शिक्षा करते, अशी मान्यता आहे.
बस्तरमधील लाकडी उरस्कल
गडचिरोली जिल्ह्यातील स्मृतिस्तंभ हे दगडाचे असतात. तर, शेजारी राज्य छत्तीसगडच्या बस्तर भागात दगडांसह लाकडाचे स्मृतिस्तंभही
उभारलेले दिसतात. या लाकडी स्मृतिस्तंभांवर सुंदर कोरीवकाम केलेलं असतं.
तर, वरती लाकडापासून तयार केलेले पक्षी, प्राण्यांची शिंगं, धनुष्यबाण
इत्यादी लावलेले असतात.
ब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ वेरियर
एल्विन यांनी त्यांच्या 'मुरिया अँड देअर गोटुल' या पुस्तकात बस्तरमधील
स्मृतिस्तंभांच्या कलात्मक आणि धार्मिक महत्त्वाची नोंद केली आहे.
फोटो स्रोत, Shatali Shedmake
फोटो कॅप्शन, वेरियर एल्विनच्या मुरिया अँड देअर गोटुल पुस्तकात उरस्कलबाबत दिलेली माहिती
एल्विन
यांच्या पुस्तकातील माहितीनुसार, उरस्कल हे मृत व्यक्तीच्या प्रतीकात्मक
रूपाचं प्रतीक आहे, जे आपल्या कुटुंबाचं, कुळाचं प्रतिनिधित्व करतात. या
स्तंभाच्या माध्यमातून त्या व्यक्तीची आठवण कायम राहते तसेच ती समुहाचं
रक्षणदेखील करते.
फोटो स्रोत, Shatali Shedmake
फोटो कॅप्शन, वेरियर एल्विन यांच्या पुस्तकातील बस्तरमधील उरस्कलचे छायाचित्र
तर,
ऑस्ट्रियन मानववंशशास्त्रज्ञ क्रिस्टोफ फॉन फ्युरर-हैमेंडॉर्फ यांनी 1945
लासी सादर केलेल्या त्यांच्या 'द प्रॉब्लेम ऑफ मेगालिथिक कल्चर ऑफ मिडल
इंडिया' या शोधनिबंधात बस्तरच्या स्मृतिस्तंभाची परंपरा आणि ईशान्य भारत व
आग्नेय आशियाई जमातींच्या प्रथांमध्ये साम्य असल्याचं नमूद केलं. त्यांच्या
शोधकार्याची नोंद विविध शोधनिबंधात आहे.
तसेच,
ही परंपरा कुळाच्या सामूहिक स्मृती जतन करण्याचं माध्यम असून ही कृती
समाजिक एकात्मता आणि सांप्रदायिक ओळख बळकट करणारी महत्वपूर्ण क्रिया
असल्याचं म्हटलंय.
कलबंडा, उरस्कल उभारण्याचा विधी
स्मृतिस्तंभासाठीचा
दगड उभारण्याची एक परंपरा, विधी आहे, तिला गोंडी भाषेत करसाड तर माडिया
भाषेत दिनाल्क असं म्हणतात. या विधीदरम्यान, मृत व्यक्तीच्या नावाने दिवा
लावून मृत्यूगीत गायले जातात. यात त्या व्यक्तीचा जन्मापासून तर
मृत्यूपर्यंतच्या प्रवासाचं वर्णन गीतांच्या माध्यमातून केलं जातं.
याबाबत
लालसु नोगोटी सांगतात, "आदिवासी समाजात तेरवी हा प्रकार नाही. माणसाच्या
मृत्यूनंतर कुटुंबीय आपल्या सोयीनुसार करसाड वा दिनाल्क करतात. दिनाल्क हा
एक खर्चिक विधी आहे. त्यासाठी कोंबडा, बकरा, डुक्कर, दारु, तांदुळ, मोहफुल
इ. वस्तू लागतात. त्यामुळे ज्यावर्षी शेतीचं उत्पन्न चांगलं होतं किंवा
घरात बऱ्यापैकी पैसापाणी असतो त्यावर्षी दिनाल्क करतात."
फोटो स्रोत, Humans of Gondwana
फोटो कॅप्शन, डोंगरावरुन दगड आणताना ग्रामस्थ
पुढे
बोलताना लालसु नोगोटी सांगतात, "दिनाल्क विधी एखाद्या लग्नकार्यासारखाच
असतो. घरातील मंडळी एक बैठक घेऊन दिनाल्कसाठीचा दिवस ठरवतात, त्यानंतर सर्व
नातेवाईकांना बोलावून सर्वजण मिळूनमिसळून तो विधी पार पाडतात. शक्यतो
होळीच्या आधी हा विधी केला जातो.
"दिनाल्क करताना तो
वैयक्तिक किंवा सामूहिक दोन्ही प्रकारे पार पाडतात. सामुहिकरीत्या म्हणजे,
गावात एका वर्षात जितक्या लोकांचे मृत्यू झाले, त्यांचे कुटुंबीय समुहानं
दिनाल्क करतात. तत्पूर्वी गोटूलमध्ये गावाची बैठक होते, त्यात एक दिवस
ठरवला जातो आणि ठरलेल्या गोष्टींनुसार विधी पार पाडला जातो.
"असं
करण्यामागचं कारण म्हणजे, कोणत्याही एका कुटुंबावर आर्थिक ताण येऊ नये,
तसेच सामुहिकरित्या मिळून विधी केल्याने आपसातील प्रेमसंबंधही टिकून
राहतात. आदिवासी समाजात सामुहिकतेचं महत्व आहे, त्यामुळे विविध उत्सव,
जत्रा, कार्य सामुहिकरित्या केले जातात. ग्रामसभांच्या माध्यमातून त्यात
आणखी बळ यायला लागलं आहे, नोगोटी सांगतात.
फोटो स्रोत, Humans of Gondwana
फोटो कॅप्शन, डोंगरावरुन आणलेल्या दगडाजवळ शोक करताना महिला
एखादी
व्यक्ती ज्या वर्षी गेली त्याचवर्षी तिचा स्मृतिस्तंभ उभारायलाच हवा असं
नसतं. कुटुंब आपल्या सोयीनुसार आणि परिस्थितीनुसार दोन-तीन वर्षानंतरही
दिनाल्क करून स्मृतिस्तंभ उभारू शकतात. परंतु, जोपर्यंत हा विधी होत नाही,
तोपर्यंत घरात लग्नकार्यासारखे शुभप्रसंग केले जात नाहीत. दिनाल्क करून
स्मृतिस्तंभ उभारल्यानंतरच शुभकार्य पार पाडतात.
दिनाल्क न
करताच कोणतंही शुभकार्य केल्यास मृत व्यक्ती रागावेल आणि शुभकार्यात विघ्न
येईल, असा समज आहे. त्यामुळेच एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर आधी
त्याचा दिनाल्क करून कालबंडा उभारल्यानंतरच पुढील शुभकार्य केले जाते.
तसेच, कोणत्याही शुभप्रसंगी कालबंडाजवळ जाऊन आशिर्वाद घेतला जातो, असंही
लालसु नोगोटी सांगतात.
हे स्मृतिस्तंभ कुठे स्थापन करतात?
स्मृतिस्तंभ
उभारण्यासाठी लागणारा दगड डोंगरावरून आणावा लागतो. डोंगरावरील दगडाची पूजा
करून परवानगी घेऊन कुटुंबातील सोयरे दगड घेऊन येतात, यावेळी इतर गावकरी
सोबत असतात.
गावातील प्रत्येक गोत्राचं स्मृतिस्तंभांचं
वेगळं स्थान असते. अशाप्रकारे वेगवेगळ्या गोत्राचे वेगवेगळे स्थान असतात.
ते सहसा गावाच्या वेशीवर, मधोमध किंवा स्मशान भूमीजवळ असतात.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
याबाबत
नंदकिशोर नैताम सांगतात, "रस्त्याने जाताना हे स्तंभ दिसले की गावाची सीमा
जवळच असल्याचे समजावे. काही ठिकाणी एक किंवा दोनच स्मृतिस्तंभ उभे दिसतात.
ते इतर स्मृतिस्तंभांपासून दूर असतता. अशावेळी सदर व्यक्ती ही गंभीर
आजाराने, अपघाताने किंवा जंगली प्राण्यांच्या शिकारीने मृत पावल्याचे
समजावे. अशा व्यक्तींचा स्मृतिस्तंभ इतरत्र उभारला जातो."
फोटो स्रोत, Humans of Gondwana
फोटो कॅप्शन, स्मृतिस्तंभावर लावण्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन जाताना एकजण
आदिवासी
समाजातील ही परंपरा अनेक शतकं जुनी असून आजही ती टिकून आहे. बस्तमध्ये दगड
आणि लाकूड दोन्हींचे स्मृतीखांब उभारण्याची परंपरा आहे. त्यातही दगडी
खांबांचं प्रमाण जास्त होतं. परंतु, डोंगरांवरील दगडं मिळण्याचं प्रमाण कमी
झालं, नदीतून दगड आणले जायचे पण आता ते ही मिळत नसल्याने बस्तरमधील मुरिया
समाजात लाकडाच्या खांबाचा वापर केला जाऊ लागला. तर भामरागड तालुक्यात आता
सिमेंटपासून बनवलेले खांब वापरले जात आहेत.
फोटो स्रोत, Harshit Charles
फोटो कॅप्शन, एखाद्या व्यक्तीला समाजात मोठा मान असेल तर मृत्यूनंतर त्यांच्यासाठी तितकाच मोठा स्तंभ उभारतात.
काळानुसार
होत असलेल्या बदलांचा परिणाम आदिम संस्कृतीवर पडताना दिसतोय. वाढतं
शहरीकरण, गावांचा विस्तार, औद्योगिकीकरण आणि नक्षलवादी चळवळींनी या
पारंपारिक पद्धतींना विस्कळीत केले आहे.
दगडी
स्मृतिखांबांपासून तर रंगवलेल्या लाकडी खांबापर्यंत आणि सिमेंटने तयार
केलेल्या स्मृतिस्तंभांपर्यंत एक मोठा बदल दिसून येतो. हे विकसित होत
असलेल्या सांस्कृतिक गतिशीलतेच्या बदलावाचं जणू प्रतिबिंबच आहे.
दुर्लक्षित,
उपेक्षित आदिवासी समुदाय, त्यांच्या आदिम संस्कृतींच जतन, संसाधनांच्या
मर्यादा आणि आधुनिक, विकासवाटेच्या हस्तक्षेपांमुळे आदिवासी समाजापुढे नवी
आव्हानं आहेत.
या सर्व बदलांसह आदिम समुहाचे आपली
संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. देशभरात सगळीकडे
विखुरलेल्या संस्कृतीचं जतन करणं ही काळाची गरज आहे.
२०२५ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राने
भारताच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेल्या सहा मालमत्तांमध्ये मुदुमल
मेनहिरसचा समावेश आहे.
वजीराम संपादक - 17 मार्च 2025, 11:37 IST
मुदुमल मेगालिथिक मेनहिर्स ताज्या बातम्या
अलिकडेच, तेलंगणातील मुदुमल मेगालिथिक मेनहिर हे
स्तंभ भारताच्या तात्पुरत्या युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात
आले आहेत, ज्यामुळे त्यांचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व अधोरेखित
झाले आहे.
मेनहिर बद्दल
मेनहिर हे मोठे उभे दगड असतात , जे बहुतेकदा मेगालिथिक दफन किंवा धार्मिक विधी स्थळांचा भाग असतात .
युरोप, आफ्रिका आणि आशियामध्ये आढळणारे , ते पश्चिम युरोपमध्ये सर्वाधिक संख्येने आढळतात .
ते आकारात वेगवेगळे असतात , बहुतेकदा असमान आणि चौरस असतात आणि कधीकधी वरच्या दिशेने बारीक होतात .
मेनहिर हे वर्तुळ, अर्धवर्तुळ, लंबवर्तुळ किंवा समांतर ओळींमध्ये मांडलेले असतात .
सर्वात प्रसिद्ध संरेखन म्हणजे फ्रान्समधील कार्नाक स्टोन्स, ज्यामध्ये २,९३५ मेनहिर आहेत .
काही मेनहिरमध्ये कोरीवकाम केलेले असते , जे कदाचित प्रजनन संस्कार आणि ऋतू चक्रांशी जोडलेले असते .
मेगालिथ म्हणजे काय?
मेगालिथ हे दगडी बांधकाम आहेत जे दफनभूमी किंवा स्मारक (गैर-दफनवीन) म्हणून वापरले जातात .
दफन मेगालिथ :
डोल्मेनॉइड सिस्ट (बॉक्स-आकाराचे दफन कक्ष).
केर्न वर्तुळे (कबरी चिन्हांकित करणारे दगडी वर्तुळे).
कॅपस्टोन्स (मशरूमच्या आकाराचे दफन कक्ष, प्रामुख्याने केरळमध्ये).
दफन न केलेले मेगालिथ : मेनहिर हे स्मारके किंवा खगोलीय चिन्हक म्हणून काम करतात .
भारतातील मेगालिथिक संस्कृती : भारतातील बहुतेक मेगालिथ लोहयुगातील (१५००-५०० ईसापूर्व) काळातील आहेत .
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे केंद्रित .
मुदुमल मेनहिरचे महत्त्व
Archaeological importance: Considered one of South India’s largest megalithic-era burial sites.
The site covers 80 acres and contains:
80 tall menhirs (10-14 feet high).
3,000 alignment stones in rows (20-25 feet apart), likely linked to ancient funerary rites.
Astronomical Significance: Likely served as an ancient astronomical observatory.
Menhir alignments coincide with solar events such as:
Equinoxes (day and night are equal).
Solstices (longest and shortest days of the year).
A unique menhir with cup marks is considered the earliest known depiction of a constellation in South Asia (Ursa Major/Saptarshi Mandal).
Cultural and Religious Significance: The local population worships some menhirs, calling them “Niluralla Thimmappa” (Thimmappa of the Standing Stones).
A particular menhir is revered as Goddess Yellamma, reflecting living cultural traditions.
Mudumal’s UNESCO Tentative List Status
Telangana currently has only one UNESCO World Heritage Site—Ramappa Temple, inscribed in 2021.
Added to the UNESCO Tentative List in 2025, along with:
Palace-Fortresses of the Bundelas (Madhya Pradesh & Uttar Pradesh).
India now has 62 sites on its Tentative UNESCO List, a mandatory step before full inscription.
Mudumal Megalithic Menhirs FAQs
Q1. What are Mudumal Megalithic Menhirs?
Ans. They are ancient standing stones in
Telangana dating back 3,500–4,000 years with significant astronomical
and cultural importance.
Q2. Why are the Mudumal Menhirs significant?
Ans. They showcase advanced prehistoric
knowledge of astronomy and mathematics while being deeply rooted in
local cultural traditions.
Q3. What is the latest development regarding Mudumal Menhirs?
Ans. They were added to India’s UNESCO Tentative World Heritage List in 2025, marking a step toward full recognition.
उत्तरपुराणाश्मयुग :
हा काळ
सर्वसाधारणपणे पंचवीस हजार ते दहा वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. या
काळाचा आरंभ चाळीस हजार वर्षांपूर्वी झाला असावा, असेही एक मत प्रसृत आहे.
यूरोपपुरता हा काळ निश्चित असून, चौथ्या हिमयुगात जी तीन हिमप्रसरणे झाली
त्यांतील पहिल्या व दुसऱ्या प्रसरणांच्या मधल्या काळात मध्य यूरोप वा
दक्षिण रशिया येथे याचा उदय झाला. ह्या काळातील हवा थंड असल्याने या
भागातही खुरट्या वनस्पती आढळत. रेनडिअरसारख्या प्राण्यांचे कळप त्यामुळे
सर्वत्र वावरत होते. तसेच भीमगजा- सारखे काही काही प्राणी दक्षिण यूरोपात
होते. वंशशास्त्रज्ञ ज्याला ‘होमो सॅपियन’ असे नाव देतात त्याच्या
क्रोमॅग्नन व कोम्ब कापेल ब्रून मानव ह्या दोन शाखा यूरोपात सर्वत्र
पसरल्या होत्या. होमो सॅपियनला पूर्णार्थाने मानव समजण्यात येते. पश्चिम
आशियातही ही संस्कृती दिसून येते. इतर खंडांतील या संस्कृतीचे अस्तित्व व
स्वरूप याबाबत तज्ञांत एकमत नाही. पेरीगोर्डियन किंवा ऑरिग्नेशियन,
सॉल्यूट्रीअन, मग्डलेनिअन हे मुख्य समाजगट त्या वेळी अस्तित्वात होते.
नैसर्गिक गुहांचा निवासासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जाई. त्यांत काही
ठिकाणी चित्रकाम आढळले आहे. पारलौकिक जीवन आणि अतिमानुषी शक्ती यांसंबंधी
येथे विचार असावा इतका पुरावा मृतात्म्यासंबंधीची थडगी व विधी ह्यांमधून
ज्ञात होतो.
गारगोटीच्या दगडाची पातळ व सरळ पाती असलेली संयुक्त आयुधे
बनविण्यात येऊ लागली. पानाच्या आकाराची बाणाची टोके, तासण्या, टोचे
(Awl-Burin) ही विशिष्ट आयुधेही ह्या काळात वापरात होती. लाकूड व शिंगे
यांचाही हत्यारांच्या निर्मितीसाठी वाढता उपयोग करण्यात येऊ लागला होता.उत्तराश्मयुगाचा आरंभ नूतनतम काळाच्या आरंभी (इ.स.पू. १०,०००) झाला. काही
भागांत तो इ.स.पू. ७,००० इतका नजीकचाही असू शकेल. मध्य व उत्तर भारताच्या
काही भागांत असणारे घनदाट जंगलांचे प्रदेश सोडल्यास, इतरत्र मानवाची वस्ती
उघड्यावर नदीकाठाने होती. पण या दोन जंगलांच्या प्रदेशांत मात्र मानवी
वस्ती प्रस्तरालये व गुहा यांतच होती. या प्रस्तरालयांतील चित्रकामही
उत्तराश्मयुगीनच असण्याचा संभव आहे. या युगातील आयुधे, लघुअश्मास्त्रे याच
सदरात जमा होतात व यांत मुख्यत्वे गारेच्या दगडाची किंचित लांबटशी पाती
आहेत. त्यांपासून चाकूची पाती, चंद्रकोरी, टोचे ही आयुधे तयार करण्यात येत.
ती आयुधे हाडे व काठ्या यांजबरोबर वापरण्यात येणारी, म्हणजे संयुक्त आयुधे
होत. ⇨ लांघणज या गुजरातमधील ठिकाणाखेरीज अन्यत्र उत्तराश्मयुगीन स्थायिक
वसाहतींचे अवशेष उपलब्ध नाहीत. शिकार, मच्छीमारी व प्राथमिक स्वरूपाची शेती
हीच या काळातील उपजीविकेची मुख्य साधने होत. मृत्पात्रांचा वापरही सुरू
झाला असावा. लांघणज याच ठिकाणी काही मानवी सांगाडे सापडले असून ते मिश्र
वंशाचे आहेत. हातपाय पोटाशी ठेवून हे सांगाडे थडग्यांत पुरण्यात आले होते.
या भागात पाणघोडे, अस्वले, हरणे, सांबरे, रानगाई असे प्राणी वावरत असत.
आंतराश्मयुग
:
ह्याचा पंधरा हजार वर्षांपूर्वी आरंभ होऊन दहा हजार वर्षांपूर्वी त्याचे
पूर्ण प्रगल्भावस्थेत रूपांतर झाले. तथापि त्याचे अस्तित्व अत्यंत
मर्यादित होते. चौथ्या हिमयुगाच्या तिसऱ्या प्रसरणाच्या काळात ह्यास
सुरुवात झाली. थंड हवेऐवजी पर्जन्यमानात हळूहळू वृद्धी होऊ लागली व
त्यामुळे गवताळ जंगलांची वाढ झाली आणि जीवसृष्टी सध्यासारखी निर्माण झाली.
क्रोमॅग्नन मानवाच्या वंशाचा सर्वत्र प्रसार झाला. त्याविषयीचा पुरावा
यूरोप व पश्चिम आशिया या भागांत प्रामुख्याने आढळतो. इतर खंडांतील या
विशिष्ट सांस्कृतिक स्तबकाचे स्वरूप व विस्तार यांविषयी फारशी माहिती ज्ञात
नाही. अझिलियन, टार्डेनोइशिअन, ॲस्टुरियन, एर्टेबोल, पॅलेस्टाइन (यूरोप)
नाटुफियन (उत्तर ईजिप्त) हे प्रमुख समाजगट येथे होत. मुख्यत: हे उघड्यावर
वा तळ्यांच्या काठी कातडी तंबूंतून निवास करीत. मात्र त्यांपैकी काही
गुहांतही राहत असावेत. काही भागांत जमिनीत बोगद्यासारखे खड्डे करून त्यांचा
त्यांनी राहण्यासाठी उपयोग केला होता. ‘सूक्ष्मपाषण’ नावाने ओळखली जाणारी
गारगोटीच्या दगडाची त्रिकोण, चंद्रकोर इ. विविध आकारांची पाती वापरून ते
संयुक्त हत्यारे बनवीत. मांस व आपोआप उगवणाऱ्या धान्याचेही ते भक्षण करीत.
ह्या काळात प्राणी माणसाळविण्यास आरंभ झाला असावा.
नवाश्मयुग : (Neolithic Age) :
ह्या काळास इ.स.पू. आठ हजारांच्या पुढे आरंभ झाला. इ.स.पू. पाच हजारांच्या आसपास त्याची विशेष प्रगती झाली. त्या वेळी हवामान, प्राणी व वनस्पतिसृष्टी सध्यासारखीच होती. मानववंशही बहुधा आज असणारेच होते. बारीक दगडी पात्यांची उपकरणे, घासून गुळगुळीत व धारदार केलेल्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या यांची निर्मिती व वापर ह्या काळात होऊ लागला. चीन व आग्नेय आशिया या भागांतील हत्यारांचे आकार भिन्न आहेत. या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीही अनेक दृष्ट्या पश्चिमेकडील तत्कालीन संस्कृतीपेक्षा भिन्न आहे. या वेळी गाय, बैल, डुक्कर, मेंढी व शेवटी शेवटी घोडा हे प्राणी माणसाळले होते. पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय सुरू झाला होता. याबरोबरच धान्य पिकविण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. या व्यवसायाचा आरंभ पॅलेस्टाइनमध्ये झाला असावा. कारण आतापर्यंत हाती आलेले याबाबतचे सर्वांत प्राचीन नवाश्मयुगीन अवशेष या भागातीलच आहेत. मानवास शेतीसाठी बराच काळपर्यंत एकाच ठिकाणी राहण्याची जरूर भासू लागली आणि त्यामुळे उपजीविकेला एक प्रकारची शाश्वती आली. म्हणून स्थिर स्वरूपाच्या वसाहतींना प्रारंभ होऊन पहिली खेडी निर्माण झाली. गवत, लाकूड, कच्च्या विटा, दगड यांनी ही घरे बांधलेली असत. काही भागांत (पूर्व आशिया) भूमिगत घरांचाही वापर होता. शेकडो वर्षांच्या वाटचालीतून ह्या स्थिरपद जीवनाचा लाभ झाला. त्या पायावरच नागरी संस्कृतीची कालांतराने उभारणी झाली. धातूंचा शोध लागल्यावर वरील प्रक्रियेला गती मिळाली आणि अश्मयुगाचा अस्तही होऊ लागला. अश्मयुगाचा अस्त प्रथम इ.स.पू. ३०००च्या सुमारास मेसोपोटेमिया व ईजिप्त या ठिकाणी झाला. भारतातील नवाश्मयुग आणि ताम्रपाषाणयुग ही दोन्ही साधारण समकालीनच आहेत. नवाश्मयुगीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवशेषांतही तांब्याच्या वस्तू सापडतात. ताम्रपाषाणयुगीन समाजही नवाश्मयुगीनांप्रमाणेच शेतकी, पशुपालन यांवरच जगत असे. म्हणून या दोन स्वतंत्र अवस्था समजाव्यात किंवा कसे, यावर तज्ञांत एकमत नाही. तथापि घासून गुळगुळीत केलेल्या दगडी कुऱ्हाडी वा छिन्न्या यांसारखे आयुधप्रकार आणि इतर ठिकाणच्या नवाश्मयुगीनांशी असणारी साम्ये ध्यानात घेऊनच काही समाजांना नवाश्मयुगीन तर काहींना ताम्रपाषाणयुगीन संबोधण्यात येते. भारतातील ताम्रपाषाणयुगाचे तीन पृथक भाग पडतात. एक उत्तर व वायव्य भारतातील, दुसरा पूर्व भारतातील व तिसरा दक्षिण भारतातील. या सर्व संस्कृतीचा काळ इ.स.पू. दुसरे सहस्रक व त्याच्या थोडा पुढे मागे असा आहे. याला अपवाद फक्त बलुचिस्तानच्या सरहद्दीनजीकच्या ⇨कुल्ली, झॉब या संस्कृतींचा असून त्या संस्कृती इ.स.पू. चौथ्या सहस्रकातील आहेत. परंतु भारतातील इतर समाजांशी त्यांचा सलग संबंध अद्याप प्रस्थापित झालेला नसल्याने व पश्चिम आशियातील नवाश्मयुगीन संस्कृतींशी त्यांचा जास्त निकटचा संबंध स्पष्टपणे दिसत असल्याने, त्यांना त्या क्षेत्रातील संस्कृतीच्या शाखा समजणे अधिक उचित ठरेल. उत्तर भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा नवाश्मयुगीन संस्कृतीचा आढळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये झेलमच्या खोऱ्यात झाला आहे. बूर्झाहोम येथील उत्खननांत गवसलेल्या अवशेषांवरून या समाजाच्या जीवनविकासाचे दोन टप्पे दिसतात. पहिल्यात, जमिनीत मोठाले खड्डे करून त्यांत वस्ती करण्यात येई. हे खड्डे सामान्यपणे तीन मी. व्यासाचे असून त्यांची खोली दीड ते चार मी. होती. यावर फांद्या व गवत यांचे छप्पर असावे. घासून धार लावलेली दगडी हत्यारे, हाडांचे टोचे, दाभण, राप्या व हातघडणीची मृत्पात्रे ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये होत. दुसऱ्या टप्प्यात, कच्च्या विटांची घरे बांधण्यात येऊ लागली. मृत्पात्रे घडविण्यासाठी चाकाचा वापर सुरू झाला. क्वचित तांब्याची हत्यारे सापडतात पण धातूच्या उपयोगाचे ज्ञान अगदी प्राथमिक स्वरूपाचे असावे. बी पेरण्याकरिता जमिनीत खळगे करण्यासाठी अणकुचीदार काठ्या वापरीत व त्या जोराने जमिनीत घुसाव्यात म्हणून त्यांभोवती दगडी कडी बसवीत. अशी वजने व दगडाचे विळ्यासारखे हत्यार सापडले आहे. यांवरून शेती करण्यात येई असा निष्कर्ष निघत असला, तरी हाडाच्या हत्यारांचे जे विविध प्रकार दिसतात त्यांवरून शिकारीलाच प्राधान्य असावे, असे दिसते. या काळातील काही थडग्यांत माणसांबरोबर कुत्रीही गाडलेली दिसतात. थडग्यातील सांगाड्यांवरून तेथील माणसांच्या वंशांची कल्पना येत नाही. जमिनीत खड्डे करून राहण्याची पद्धत व दगडी विळे यांवरून उत्तर भारतातील ही संस्कृती तत्कालीन चिनी नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबद्ध असावी, असे मानता येते. दुसरे क्षेत्र म्हणजे, ओरिसा, बिहार, आसाम या क्षेत्रांतील नवाश्मयुगीन संस्कृतीचे पूर्वक्षेत्र. गोल बुडाच्या दगडी कुऱ्हाडी, छिन्न्या व मुख्यत: चौकोनी खांद्यांच्या दगडी कुऱ्हाडी ही येथे सापडणारी वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होत. या क्षेत्रातील निरनिराळ्या ठिकाणची मृत्पात्रे भिन्न प्रकारांची आहेत. येथे झालेले संशोधन पूर्ण कल्पना देण्यास पुरेसे नसले, तरी त्यातील विशिष्ट आयुधांवरून या संस्कृतीचा अन्यत्र जोडता येतो. तिसरे क्षेत्र दक्षिण भारतातील नवाश्मयुगीन संस्कृतीचे. हे क्षेत्र उत्तर कर्नाटक व वायव्य आंध्र प्रदेश यांचे मिळून होणारे असून येथे मोठ्या प्रमाणावर उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांपैकी ⇨ ब्रह्मगिरी, पिकलीहाल, टेक्कलकोटा ही महत्त्वाची होत. तेथे गोल वा चौकोनी आकाराच्या कुडाच्या घरांतून मानवी वस्ती होती. क्वचित वस्तीसाठी उंच अशा टेकड्यांवरील सपाट भागांचा उपयोग केलेला दिसतो. पहिल्या कालखंडात हातघडणीची राखी मृत्पात्रे वापरीत. दुसऱ्या कालखंडातील मृत्पात्रे तांबूस काळसर रंगाची आहेत. कोठेकोठे रंगीत नक्षीकाम केलेली मृत्पात्रेही या कालखंडात वापरलेली दिसतात. घासून गुळगुळीत केलेल्या कुर्हाडी, छिन्न्या यांसारख्या हत्यारांबरोबर दगडी पात्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असे. दफनाची पद्धती अस्तित्वात असून मृताशेजारी त्याची आयुधे व भांडीही ठेवलेली आढळतात. या नवाश्मयुगीन संस्कृतीचा संबंध इतर भागांतील तत्सम संस्कृतींशी जोडण्याइतका प्रत्यक्ष पुरावा हाती नसला, तरी काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंवरून, वर उल्लेखिलेल्या वायव्य भारतातील संस्कृतीप्रमाणेच ह्याचाही संबंध पश्चिम आशियातील नवाश्मयुगीनांशी असावा असे दिसते. तथापि निश्चित संबंध जोडता आलेले नाहीत, हे मान्यच करावयास हवे. वरील तिन्ही क्षेत्रांत पशुपालन व शेतकी हीच उपजीवविकेची प्रमुख साधने होती.
नवाश्मयुगीन मानवाची वैशिष्ट्ये :- १)दगडी नांगराद्वारे शेती करण्याचे तंत्र या काळात मानवाने अवगत केले.
२)शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती या मानवाने केली.
३)या काळातील मानवाने अन्न संचयनासाठी मृदभांड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला.
४)कुंभाराच्या चाकाचा शोध लागल्याने या काळातील मानवाचे जीवन गतिमान बनले.
५)या काळातील मानव हा अग्नीचा उपयोग करू लागला.
६)शेतीमुळे मनुष्य जीवनास स्थैर्य प्राप्त झाले व समूहाने गावात राहण्याची सुरुवात झाली.
७)उत्खननातून मोठ्या प्रमाणात भित्तिचित्रे मिळतात.
८)झाडांच्या साली व कातडी वस्त्राबरोबरच कापसाद्वारे आणि लोकरीद्वारे कापड विणण्याचे ज्ञान या काळातील मानवाला झाले.
९) या काळातील घरे, लाकडाची, दगडाची बनली होती.झोपडी बांधूनही लोक राहात होते. व खेड्यातहीघरे बांधल्याचे अवशेष येथे प्राप्त होतात.
१०)या काळातील मानव हे मूर्तिपूजक होते.
मानवी जीवन
अन्न
:
मानवी जीविताच्या आद्य निकडींपैकी पहिली अन्न होय. अश्मयुगापैकी पहिल्या
दोन खंडांतील मानवाचे मुख्य अन्न म्हणजे त्याच्या भोवताली वावरणारे
प्राणी, थोड्याफार प्रमाणात फळेमुळे-वनस्पती. आपले भक्ष्य मिळविण्यासाठी
मानवाला त्याच्या शरीरशक्तीपेक्षा बुद्धिबलाचा अधिक वापर करणे भाग होते.
कारण भोवतालचे बहुतेक सर्व प्राणी त्याच्यापेक्षा ताकदवान, चपळ होते किंवा
त्यांना निसर्गाकडून मिळालेली स्वरक्षणाची साधने मानवाला दूर ठेवण्यास
पुरेशी होती. अशा स्थितीत माणसाने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे गटागटाने
शिकार करणे हे होय. अश्मयुगीन मानव ताकदीत भारी असणारा प्राणी कोंडीत पकडून
त्यास दगड-धोंड्यांनी ठेचून मारी. पूर्वपुराणाश्मयुगात प्रचंड गवे व गेंडे
अशा प्राण्यांना खड्ड्यात फसवून मारण्याची विद्या मानवाने हस्तगत केली
होती. असे खड्डे व त्यांत फसलेल्या प्राण्यांची हाडे यूरोपात मिळाली आहेत.
मात्र अग्नीचे ज्ञान झाल्यावर गुहांत विसावणाऱ्या श्वापदांना हुसकून बाहेर
काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तरपुराणाश्मयुगात रेनडिअर,
सांबर, घोडे अशा वेगवान प्राण्यांचे कळप घेरून उंच अशा कड्याकडे वळविण्यात
येत. भेदरलेली ही जनावरे धावण्याच्या वेगात कड्यावरून खाली पडत व तेथे
थांबलेल्या शिकाऱ्यांच्या हातात ती अलगद सापडत. सांघिक शक्तीचे हे वेगवेगळे
प्रयोग अन्नप्राप्तीच्या कामात माणसाला उपयुक्त ठरले. तद्वतच त्याची
स्वत:ची संहारशक्ती नवनव्या आयुधांमुळे वाढत गेली. भाले, बोला, धनुष्यबाण
इ. शस्त्रांमुळे स्वत: सुरक्षित राहूनही त्यास जास्त परिणामकारकपणे शिकार
मिळवणे शक्य झाले. मच्छीमारीसाठी लहान होडगी आणि बांबूची प्रचंड टोपली
यांचा उपयोग मानव आंतराश्मयुगात यूरोपमध्ये करीत होता. हाडांचे गळ, काटेरी
बाण यांचाही उपयोग मासे व इतर जलचर प्राणी मारण्यास करण्यात येई.
आंतराश्मयुग
व नवाश्मयुग यांच्या संधिकाळात मेंढ्या, गाई व इतर काही प्राणी माणसाळवून
पाळण्याची विद्या मानवाने साधली. अशा प्राण्यांचे कळप बाळगण्यात येत व
त्यांचा उपयोग प्रामुख्याने भक्षणासाठीच होत असे. पाळण्यात आलेले हे प्राणी
तृणभक्षकच होते. त्यामुळे त्यांचे कळप घेऊन चराऊ कुरणांच्या शोधासाठी
दूरदूर अंतरावर फिरणे त्यास आवश्यक झाले किंवा वर्षभर चारा असेल अशा ठिकाणी
त्यास स्थायिक व्हावे लागले. पशुपालनाची ही अवस्था अगदी प्राथमिक असली,
तरी तिची मुख्य फलनिष्पत्ती अन्नाची शाश्वती हीच होय.
याच्याच आसपास
केव्हा तरी शेतीचा शोध लागला असावा. आरंभी मुद्दाम पेरण्यात आलेले धान्य
म्हणजे गहू असावे. रानटी गव्हाच्या लोंब्या जमिनीवर पडतात, तेथे पुन्हा
रोपे उगवतात, तेथेच नवा गहू येतो, हे जीवितचक्र माणसाच्या ध्यानात आले
असावे. फळे, कंदमुळे गोळा करण्याचे काम मुख्यत: स्त्रियांकडे आले व हे
निसर्गाचे चक्र प्रथम त्यांच्यात लक्षात आले असावे. कदाचित स्त्रियांनीच
धान्य पेरण्यास आरंभ केला असावा. हा शेतीचा म्हणजे पर्यायाने नवाश्मयुगाचा
आरंभ होय.
शिकार, मच्छीमारी, पशुपालन व नंतर शेती हे अश्मयुगीन
माणसाचे क्रमश: मुख्य व्यवसाय होते. पुराणाश्मयुगात व आंतराश्मयुगात मात्र
फक्त पहिले दोनच व्यवसाय होते. नवाश्मयुगात पशुपालन व शेती हे प्रधान
व्यवसाय झाले, तरीही थोड्याफार प्रमाणात शिकार व मच्छीमारी होतच राहिली.
त्याच्या जीविताच्या इतर शाखांचे स्वरूप बऱ्याच अंशी त्याच्या
व्यवसायांवरून निश्चित झालेले दिसते.
अश्मयुगाच्या विविध अवस्थांत
मानवी अन्नाचे रूपही पालटत गेले. पुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन माणसाच्या
अन्नात सर्व प्रकारच्या लहानमोठ्या प्राण्यांचा आणि फळे व कंदमुळे यांचा
समावेश होता. मोसमात व विशिष्ट प्रदेशात सापडणारे सर्व प्रकारचे लहान-मोठे
प्राणी खाद्य होते इतकेच काय, फार जरूर वाटल्यास नरमांसभक्षणही होत असे.
एरवी हरणे, डुकरे, हत्ती, भीमगज, अस्वले, घोडे हे प्राणी नित्याचे भक्ष्य
होते. आंतराश्मयुगात याशिवाय मासे व इतर जलचर यांचा अन्नात समावेश झाला. या
युगाच्या शेवटी शेळ्या-मेंढ्या, गायी-बैल यांसारख्या पाळीव जनावरांचे मांस
हा आहाराचा एक भाग झाला. नवाश्मयुगात धान्या- बरोबरच मांसाहारही चालूच
राहिला.
शेती करण्यास आरंभ झाल्यावर गहू, बार्ली, मका, ज्वारी,
बाजरी, राय ही धान्य व वाटाणा, घेवडा, मूग, हरभरा व मसूर यांसारखी द्विदल
धान्ये स्थलकालपरत्वे पिकविण्यात येऊ लागली. तेल मिळविण्या- साठी
ऑलिव्हसारख्या फळांचा वापर आग्नेय स्पेनमधे होत असे. नासपती, सफरचंद, बोरे
अशांसारखी फळेही या माणसाला उपलब्ध होती. पण त्यांची मुद्दाम लागवड केलेली
नसे. पाळीव जनावरांत शेळ्या, गाई व डुकरे ही मुख्य असत. यांच्या मांसाचा
खाण्यासाठी उपयोग होई. लामा, उंट, घोडा ही इतर पाळीव जनावरे वेळप्रसंगी
भक्षणासाठी उपयोगी पडली, तरी मुख्यत्वे त्यांचा उपयोग वाहतुकीसाठीच होत
असे.
समाजरचना : अश्मयुगीन समाजरचनेविषयी उत्खननातून मिळणारा पुरावा
अप्रत्यक्ष व अल्प आहे. मिळालेल्या अवशेषांवरूनच काही अनुमाने बांधावी
लागतात. या अनुमानांना बळकटी आणण्यासाठी, आजच्या मानवसदृश प्राण्यांची
वागणूक (गोरिला, चिंपांझी इ.) आणि आजही अत्यंत मागासलेल्या, रानटी
परिस्थितीत राहणाऱ्या जमातींविषयीची माहिती यांचा उपयोग करून घ्यावा लागतो.
हे सगळे करूनही अश्मयुगीन समाजव्यवस्थेसंबंधी अत्यंत त्रुटित अशीच माहिती
उपलब्ध होते.
आधीच हे स्पष्ट करावयास पाहिजे, की वैचारिक देवघेवीचे
मुख्य साधन जी भाषा, ती त्या कालखंडात केव्हा व कोणाकोणाला प्राप्त झाली
होती, याविषयी काहीही निश्चित सांगता येत नाही. परंतु पूर्वविचार व योजना,
तसेच पुरस्सर सामूहिक जीवन प्रचलित होते. त्यावरून असे काहीतरी माध्यम
अस्तित्वात असावे हे नक्की. शिकार करणे हे एकट्या-दुकट्याचे काम नसून
त्यासाठी सांघिक प्रयत्न जरूर होते. तेव्हा पहिल्या- पासूनच मानवाला गटात
किंवा टोळीत राहावे लागले आहे. या गटास कोठल्या माणसांचा समावेश होत असावा व
या गटाची रचना कशी असावी, हे प्रश्न विवाद्य आहेत. केवळ मूळ उद्देशाकडे
लक्ष ठेवून विचार केला, तर कोणाही धडधाकट माणसाचा त्यात समावेश व्हावा व
सगळ्यांत अनुभवी शिकाऱ्याच्या हुकमात सगळ्यांनी चालावे, ही सरळ उत्तरे
आहेत. पण मानवी जीवनातील कोणताच प्रश्न इतका सरळ सुटत नाही. केवळ एखाद्या
मोठ्या शिकारीला वा शिकारीच्या एखाद्या मोसमात माणसे एकत्र येण्याऐवजी काही
शाश्वत असे ऐक्य आरंभापासून अधिक प्रचलित असावे व हे ऐक्य सामाजिक
बंधासारखे असावे. रक्ताचे नाते असणारी माणसे एकेका गटात असावी आणि हा
कौटुंबिक गट असावा. पण या वेळी ‘कुटुंब’ याचा नेमका काय अर्थ असावा, याचा
उलगडा होत नाही. यात एकाच पित्याची प्रजा होती, की एकाच मातेची प्रजा होती?
अश्म- युगीन स्त्रीमूर्ती व चित्रे यांवरून काही तज्ञ असा निष्कर्ष
काढतात, की येथे मातृसावर्ण्य होते. अपत्यप्राप्तीतील मातेच्या कार्याची
साक्षात कल्पना या समाजाला होती. परंतु इतर अनेक मागासलेल्या
समाजांप्रमाणे, प्रजोत्पादनातील पुरुषाचा नेमका वाटा कोणता? याची कल्पना
अश्मयुगीन समाजाला नसावी. म्हणून मातेला, म्हणजे स्त्रीला, अधिक महत्त्व
असावे. या प्रश्नाची दुसरी बाजू अशी, की या समाजातील स्त्रीपुरुष-
संबंधाविषयीही कसलीच माहिती उपलब्ध नाही. कदाचित आजही जे प्राणिसृष्टीत
दिसते, त्याप्रमाणे त्या वेळी एक बलिष्ठ पुरुष असावा. त्याच्या चारपाच
स्त्रिया व बाल्यावस्थेतील अपत्ये एवढ्यांचा कुटुंबात समावेश असणे
स्वाभाविक होतो. नव्याने वयात येणाऱ्या स्त्रीपुरुषांना–विशेषत: पुरुषांना
–या व्यवस्थेत सामावून घेणे हा नेहमीचा प्रश्न राहणार. मग हे तरुण, आपल्या
अथवा शेजारच्या कुटुंबातील स्त्रियांना वश करून घेऊन, स्वतंत्र कुटुंबे
स्थापतील. म्हणजे पितृ-किंवा मातृ-सावर्ण्य यांपैकी कोणतीही पद्धत प्रचलित
असू शकेल. अशी कुटुंबे एकत्र येऊन त्यांचा पुढे गट निर्माण होत असे.
व्यावहारिक गरज व स्त्रीपुरुषसंबंध या दोन्हींची अशी सांगड घातली जात असणे
सुसंगत व संभाव्य ठरते. या एकेका गटाचे सर्व घटक तेथे असतीलच असे म्हणवत
नाही. तथापि एखाद्या विशिष्ट प्रदेशात राहणारी काही कुटुंबे व्यावहारिक
सोयींसाठी एकत्र गट करीत असतील. या गटाचे निष्ठास्थान रक्तसंबंध नसल्याने
काही दृश्य चिन्ह असणे उपकारक ठरेल, म्हणून एखाद्या प्राण्याचा किंवा
पक्ष्याचा, निशाणी वा गणचिन्ह म्हणून उपयोग होऊ लागला. गुहांच्या भिंतींवर
अस्वले, गेंडे अशा प्राण्यांची जी चित्रे दिसतात ती गणचिन्हेच समजता येतील.
अशा गटात तीसपासून साठापर्यंत माणसे असावीत. ही सगळी एकत्र राहत, तसेच
त्यांचे खाणेपिणेही एकत्रच होत असे. शिकारीसाठी म्हणून एखादा विशिष्ट
भूप्रदेश एकेका गटाने राखून ठेवलेला असण्याची शक्यता असावी.
गटातील
माणसे कोणती कामे करीत होती, याचे अगदी स्थूलमानाने विवेचन करता येईल.
शिकार हा प्रमुख व्यवसाय पुरुषमंडळी करीत, तर फळे, मुळे, कंद हे गोळा
करण्याचे काम स्त्रिया व मुले यांजकडे असे. मांस भाजून खाण्यास आरंभ
झाल्यावर तेही स्त्रियांचेचे काम झाले असावे. स्त्रीचे सगळ्यात महत्त्वाचे
कार्य बालसंगोपन हे होय. मानवी अपत्य दोनतीन वर्ष पूर्णपणे परावलंबी असते
हे ध्यानात घेतले म्हणजे बाल- संगोपनात स्त्रीला लागणाऱ्या वेळाची व
श्रमाची सार्थ कल्पना येईल. दगडी हत्यारे व उपकरणे तयार करणे हे काम
पुरुषांचे होते. पंचमहाभूते, वृक्ष, स्थलदेवता, मृतात्मे यांसारख्या
अतिमानुषी शक्तींवर ताबा चालविणाऱ्या पुरोहिताचा व्यवसाय गटाचा नायक किंवा
वयोवृद्ध स्त्री वा पुरुष यांपैकी कोणीही करीत असे.
उत्तरपुराणयुगातील
व आंतराश्मयुगातील गुहांच्या भिंतींवरील चित्रे, त्यांत सापडणाऱ्या
स्त्रीमूर्ती, हाडे व शिगें यांवरील कोरीवकाम, अशा कलावस्तूंची निर्मिती हा
या कालखंडात प्रचलित झालेला आणखी एक व्यवसाय होय. यांतील बरीच चित्रे व
मूर्ती धार्मिक विधींशी निगडित होत्या. तेव्हा त्यांची निर्मिती करणारी
माणसे अर्थातच समाजाने पोसलेली असावीत, असे दिसते. याच काळात हत्यारांसाठी
गारगोटीसारखे दगड वापरू लागले. हे दगड निरनिराळ्या गटांना पुरविणे हाही एक
स्वतंत्र व्यवसाय उदयास आला असावा. उत्तरपुराणाश्मयुगीन व आंतराश्मयुगीन
हत्यारे आकाराने लहान पण वैविध्यपूर्ण होती. ती तयार करण्यास विशेष
कौशल्याची आवश्यकता असल्याने अशा कारागिरांना साहजिकच गटात स्वतंत्र स्थान व
महत्त्व प्राप्त झाले असावे.
एकीकडे रक्तसंबंध आणि व्यावहारिक गरज
यांमुळे निर्माण होणारे ऐक्य, दुसरीकडे स्त्रीपुरुषसंबंधातून उत्पन्न
होणारे व व्यवसायप्रावीण्यापोटी उद्भवलेले ताण, यांच्या संघर्षातून समाजगट
टिकविण्याची व्यवस्था काय असावी? या संदर्भात व्यवहारचातुर्य व औदार्य
यांच्या जोडीला दंडशक्तीचीही गरज असली पाहिजे. ह्या दंडशक्तीचा वापर
करण्याचे काम पुरोहिताकडे असावे. अतिमानुषी शक्तीवरील श्रद्धेचा उपयोग
सामाजिक ऐक्य टिकविण्यास होत असे. याला परंपरा व रूढी यांचा चांगलाच आधार
मिळत असावा.
नवाश्मयुगात उपजीविकेच्या साधनांत मूलभूत क्रांती घडून
आली. पशुपालन अथवा शेती यांमार्गे होणारी अन्नप्राप्ती आणि शिकारीतून
होणारी प्राप्ती यांत एक फार महत्त्वाचा फरक आहे. या भेदाचे परिणाम दूरगामी
ठरले. शिकार मिळविण्यास फार तर एकदोन किंवा तीनचार दिवस जात, परंतु एकदा
मेलेला प्राणी हाताशी आला, की लगेच खाता येई शिकार करणे हे काम सतत चालू
असले, तरी त्यातून फलप्राप्ती जवळजवळ तत्काळ होत असे. आता मेंढ्या वा
गुरांचे कळप बाळगावयाचे म्हणजे, गुरे वाढवावयास हवीत. शेतात धान्य
पेरल्यानंतर प्रत्यक्ष धान्य हाती येईपर्यंत तीन ते सहा महिने इतका काळ वाट
पाहत बसावयास पाहिजे. तसेच धान्य पेरण्याच्या आधी त्या जमिनीची मशागत केली
पाहिजे. माणसाचे अवधान सतत त्याच गुरांच्या कळपावर पाहिजे, त्याच
जमिनीच्या तुकड्यावर पाहिजे. यामुळे अधिकाधिक आपुलकी निर्माण झाली व तिचेच
रूपांतर स्वामित्वाच्या भावनेत झाले. याचीच दुसरी बाजू अशी, की कळपातील
गुरांपासून अन्न मिळणार ते त्यांची जोपासना करणाऱ्याला–दुसऱ्याला नव्हे.
म्हणजे उपजीविकेच्या साधनांवर मालकी हक्काचा उदय झाला. आरंभी ही मालकी
प्रत्येक गटाची सामूहिक होती. नंतर कुटुंब हा महत्त्वाचा दुवा झाला आणि
शेवटी तेथे व्यक्ती आली. एकेका व्यकीच्या मालकीचे कळप किंवा शेतजमीन या
वेळी नव्हती पण एकेका कुटुंबाच्या सर्वस्वी मालकीची स्थापना मात्र झालेली
दिसते. याचे साधे कारण असे, की कोणाही व्यक्तीला अधिकार आणि कर्तव्य यांची
सर्वांत फायदेशीर जोड कुटुंब या समूहाद्वारेच मिळण्यासारखी होती. जमिनी
वर्षानुवर्षे टिकवून धरावयाच्या याचाच अर्थ वारसा म्हणून त्या मिळावयाच्या,
तर तो अधिकार कोणाचा हे स्पष्ट करणे म्हणजे कुटुंब या संस्थेचे रूप नक्की
ठरणे आवश्यक होते. नवाश्मयुगाच्या आरंभीच्या काळात पितृसावर्ण्य रूढ झाले.
आता पुराणाश्मयुग व आंतराश्मयुग यांतल्यासारखी स्थिती राहिली नाही. या
कालखंडातील माणसाला एकाच ठिकाणी स्थायिक होणे अत्यावश्यक झाले. केवळ
पशुपालन व मेंढपाळी करणाऱ्या लोकांना चराऊ कुरणाच्या शोधार्थ थोडीशी
भ्रमंती करावी लागत असली, तरी पशुपालन व शेती असे दोन्ही व्यवसाय करणारे
लोक कायमचे एकत्र राहू लागले.
दगडाची हत्यारे करणे, त्याला आवश्यक ते
दगडाचे प्रकार मिळविणे, थोड्याफार प्रमाणात शिकार करणे, तसेच पौरोहित्य,
कलाकृती हे सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणेच आताही चालू राहिले. मात्र शेतकी
आणि पशुपालन यांसंबंधीची तंत्रे अंगी आणणे जरुरीचे झाले. हेच सर्वसाधारण
व्यवसाय असल्याने बहुतेक स्त्रीपुरुष यांत तरबेज झाले. आता नवीन व्यवसाय
आले. घरे बांधणे, त्यासाठी सुतारकाम-गवंडीकाम आले वस्त्रे विणणे आणि
नवाश्मयुगाच्या उत्तरार्धात मृत्पात्रे तयार करणे ह्याही गोष्टी आल्या.
यांतील वेतकाम, बुरूडकाम यांसारखे काही पूर्वापार व्यवसाय होते. त्यांत
वस्त्रे विणणे याची भर पडली. मृत्पात्रे तयार करणे, ती रंगविणे हे व्यवसाय
स्त्रियाही करीत. सर्व लोक निरनिराळे व्यवसाय करीत होते. पण निरनिराळ्या
उत्पादनांची गुणवत्ता पाहिल्यानंतर असे वाटते, की प्रावीण्य मिळविलेल्या
माणसांचेच हे काम असले पाहिजे. म्हणजे व्यवसाय व त्यातील प्रावीण्य यांच्या
अनुषंगाने समाजाची व्यावसायिक विभागणी झाली होती. असे कुशल कारागीर एकाच
गावात राहत की इतर गावांत काम करीत, हे ज्ञात नाही. परंतु व्यावहारिक
सोयीच्या दृष्टीने पाहिल्यास ते फिरते असण्याचा अधिक संभव वाटतो. फिरत्या
कारागिरांच्या पाठोपाठ फिरते व्यापारीही आले असावेत. इतकी कुटुंबे कायमची
एकत्र राहू लागली. गुरेढोरे, शेतजमिनी यांवर कौटुंबिक (खाजगी) मालकी
निर्माण झाली. तंत्रज्ञांमुळे काही व्यवसायांवर एखाद्या कुटुंबाची वा
माणसाची मक्तेदारी आली. म्हणजे साहजिकच संघर्ष-प्रसंगांची शक्यता वाढली.
आतापर्यंत सामाजिक संघर्षाला पोषक असे घटक अश्मयुगीन समाजात नव्हते.
अतिमानुषी शक्तीवर श्रद्धा, मृतात्मे, पुरोहित, वडीलधारी माणसे, परंपरा
यांचे समाजावर नियंत्रण होतेच. परंतु आता दंडनीती आणि शासनसंख्या
अत्यावश्यक झाली. याच संस्थेकडे समाजाचे व त्याच्या मालमत्तेचे
बाह्यशत्रूकडून रक्षण करण्याचे दायित्वही आपोआप आले. अशी संस्था कोणत्याही
स्वरूपाची असेल त्यावर वडिलधाऱ्या मंडळीची सभा, एक वयोवृद्ध वा अनुभवी
पुढारी-धर्मगुरू (पुरोहित) प्रमुख म्हणून असावा.
शेवटी नवाश्मयुगीन
समाज शाश्वत पायावर उभा राहून समाजरचनेत महत्त्वाचे बदल घडले आणि कुटुंब ही
संस्था श्रेष्ठ ठरली. यातून नियंत्रणाची गरज निर्माण होऊन शासनसंस्थाही
याच काळात उत्पन्न झाली असावी. तिचा आवाका लहान असला, तरी मूलभूत लक्षणे
तेथून दृग्गोचर होऊ लागतात. या समाजा- च्या तंत्रज्ञानाविषयी बरीच माहिती
उपलब्ध झाली आहे.
वसतिस्थाने :
अश्मयुगीन वसाहतींचे स्वरूपही
वैविध्यपूर्ण होते. वसाहतींचा विचार करण्यापूर्वी फुटकळ निवासस्थानेच आधी
पाहावयास पाहिजेत. निवासस्थानांचे स्वरूप तत्कालीन हवामानावर अवलंबून होते.
त्यानुसार सामान्यपणे निवासांचे दोन प्रकार दिसतात. गुंफा वा प्रस्तरालय
यांसारखी नैसर्गिक आणि झोपड्या किंवा तंबू यांसारखी कृत्रिम आवरणे
निवासासाठी वापरीत. पुराणाश्मयुगातील पहिल्या दोन भागांत हवेतील तपमानाचे
चढउतार तीव्र असल्याने, विशेषत: हिवाळा फारच कडक असल्याने, मानवाने
गुंफांचा वा थोड्या पुढे झुकणाऱ्या कडेकपाऱ्यांचा आश्रय सर्वत्र केलेला
होता. सर्व प्राचीन ज्ञात अशा गुहा चीनच्या जोकोत्येन (Chou-kou-tien)
भागातच आढळल्या आहेत. त्यानंतरच्या गुहा यूरोपमधे दक्षिण फ्रान्स व उत्तर
स्पेन, आशियात पॅलेस्टाइन व सिरिया आणि आफ्रिकेतील मोरोक्को येथे आढळतात.
अल्जिरियाच्या भूमध्य सागरा- नजीकच्या प्रदेशात मध्याश्मयुगातील वस्त्यांचे
अवशेष मिळाले आहेत. यांतील काही गुंफांत उत्तरपुराणाश्म- युगात वस्ती
झाली, तर काहींत आंतराश्मयुगातही वस्ती होती. भारतातील मध्य प्रदेशातील
गुहा आंतराश्म- युगीन आहेत, तर अमेरिकेतील गुहा सांस्कृतिक दृष्ट्या
अश्मयुगाच्या विविध टप्प्यांतील आहेत. तरीसुद्धा त्या कालदृष्ट्या नजीकच्या
आहेत. पण सर्व गुहांतील किंवा प्रस्तरालयांतील निवासांत काही समान विशेष
दिसतात. निवासाला गुहा वा कपाऱ्या निवडताना त्यांची तोंडे वाऱ्याच्या
दिशेला येणार नाहीत अशी काळजी घेतली जात असे. गुहांच्या तोंडाशी काही आडोसे
असलेच, तरी त्यांविषयी विशेष माहिती मिळत नाही. गुहा बरीच खोल असेल, तर
मुखाच्या भागातच वस्ती होई. तथापि फार खोलातली जागा टाळलेली दिसते. या
आतल्या भागाचा चित्रकामाला वा काही पूजाअर्चा यांसारख्या विधींना उपयोग होत
असावा. त्यांना ‘मंदिरे’ किंवा ‘पूजास्थाने’ अशीही नावे यामुळे दिली
जातात. अत्यंत कडाक्याच्या हिवाळ्याला उतार पडल्याबरोबर तळी, नद्या यांच्या
काठी माणसे उघड्यावरही राहत असतील, अशा काही ठिकाणी त्यांच्या अस्तित्वाचा
निर्णायक पुरावा ⇨ ओल्हुवायी गॉर्ज (आफ्रिका) येथे मिळाला आहे. तेथे
त्यांनी काही झोपड्या वा घरे बांधली. याविषयीच्या खाणाखुणांचा मात्र काहीच
मागमूस आज लागत नाही. माणसाने उभारलेल्या आसऱ्या- चे स्पष्ट अवशेष
उत्तरपुराणाश्मयुगातच प्रथम मिळतात. तेही एका विशिष्ट भागातच आणि एका
विशिष्ट समाजगटाशी निगडित आहेत. आग्नेय यूरोपात चेकोस्लोव्हाकियात
व्हिस्टोनीस, ऑस्ट्रोव्हा व पेट्रोव्हिज दक्षिण रशियात डॉन नदीवरील
गागारिनो येथे व सायबेरियात टिमोनोव्हका येथे हे अवशेष मिळतात. पहिल्या
दोघांचा संबंध ग्रेव्हॅटियन लोकांशी आहे आणि भीमगज या अजस्र प्राण्याची
शिकार हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने या लोकांना त्याच्या पाठोपाठ
विरळ जंगलात येऊन राहणे भाग पडले. स्वाभाविकच त्यांनी काही आश्रयस्थाने
बांधली. यांना घरे म्हणण्यापेक्षा तंबू वा झोपड्या म्हणणे अधिक सोयीचे
ठरेल. वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार अशा रचनेच्या या झोपड्या आकाराने
पुष्कळच मोठ्या असत (उदा., व्हिस्टोनीस : १५ मी. लांब व ९ मी. रुंद). यांवर
झाडाच्या फांद्या तिरप्या एकमेकांना टेकून त्यांवर पाला, गवत वा कातडे
पसरण्यात येत असे. जेथे सबंध छप्पर कातडी एकमेकांना जोडून तंबूसारखे करीत,
तेथे ताण देण्यासाठी मोठाले घोडे वा भीमगजाचे सुळे त्यांच्या कडेवर ठेवलेले
दिसतात. छप्पर जमिनीवरच टेकत असल्याने भिंतीची गरजच नव्हती. परंतु एखाद्या
ठिकाणी, विशेषतः जमीन उतरती असल्यास, दगडामातीची लहानशी भिंतही बांधण्याची
विद्या त्यांना ज्ञात होती (व्हिस्टोनीस). भोवतालच्या जमिनीपेक्षा घराची
जमीन खोलगट असे. जमिनीवर सपाट दगड अंथरून क्वचित फरशीही केलेली दिसते.
मध्यभागी ओळीने चुलखंडे घातलेली असत– एका झोपडीत अशी पाच चुलखंडे आहेत.
परिघानजीक खळगे करून साठवणाची व्यवस्था होई. टिमोनोव्हका (सायबेरिया) येथे
उत्तरपुराणाश्मयुगात प्रचारात असलेल्या दुसऱ्या एका प्रकारच्या घरांचे
अवशेष मिळाले आहेत. ही घरे कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठीच तयार
केलेली असावीत, यात शंका नाही. यांना कृत्रिम गुंफा म्हटले तरी चालेल.
त्यांच्या रचनेसाठी जमिनीत तीन मी. किंवा अधिकही खोल असा गोल खड्डा करण्यात
येई. याचा व्यासही तेवढाच आहे. आत जाण्यासाठी जिना असे. वरच्या बाजूने
मोठाली लाकडी आडवाटे वा बांबू टाकून त्यावर गवत, पाला व चिखल थापून छप्पर
तयार करीत. साधारणपणे जिन्यानजीक किंवा झोपडीच्या (खड्ड्याच्या) बाहेर
उघड्यावर चुली पेटविण्यात येत. चीनमधील शान्सी प्रांतात तसेच भारतात
काश्मीरमध्ये ⇨ बुर्झाहोम येथे अशा प्रकारची घरे सापडली आहेत. मात्र दोन्ही
ठिकाणी ती नवाश्मयुगातीलच आहेत. परंपरेच्या सातत्याची कल्पना देण्यासाठी
त्यांचा येथे उल्लेख केला आहे. आंतराश्मयुगीन निवासांची सर्व माहिती
बव्हंशी यूरोपातूनच मिळालेली आहे. पुराणाश्म- युगाच्या मानाने हवामान बरेच
उष्ण असल्याने गुहांतून वा प्रस्तरालयांतून राहण्याची किंवा खड्ड्यासारख्या
घरांतून राहण्याची आता जरूर नव्हती. त्यामुळे वर्षभर उघड्या मैदानावर आता
राहता येऊ लागले. स्वाभाविकच घर बांधण्याची विद्या आता प्रगत झाली. या
प्रगतीला मुख्य हातभार कशाचा लागला असेल, तर तो माणसाच्या जीविताला
लाभलेल्या स्थैर्याचा. विशेषतः नद्यांच्या वा तलावांच्या आसपास बारमास
मासळी मिळू लागली. तेव्हा येथे राहणे आवश्यक झाले. या वेळेपर्यंत जंगलाची
वाढही झालेली होती व लाकडाचा सफाईने उपयोग करता येऊ लागला. परिणामी जास्त
टिकाऊ व प्रशस्त घरे या काळात रूढ झाली. घर बांधण्यासाठी वाळवंटी (कोरडी)
किंवा थोड्या उंचवट्यावरची जमीन निवडण्यात येऊ लागली. कोरडी जमीन मिळाली
नाही, तर तीवर फांद्या, पालापाचोळा, झाडाच्या साली अंथरीत (जर्मनी–लूबेक
इंग्लंड–स्टारकार) व त्यावर माती पसरून कोरड्या जमिनी तयार करीत. घरे
सामान्यतः गोल व लंबगोल आराखड्याची असत. लाकडी (फांद्यांच्या) भिंती व तशीच
छपरे असत. क्वचित कातडी छप्परही असे. घर उभे करताना कोठे कोठे दगडांचा
वापरही केला आहे. आतापर्यंतच्या काळात सहसा न आढळणारी एक गोष्ट आता दिसू
लागते ती म्हणजे घरांचे समूह. इंग्लंडमध्ये सरे परगण्यात किंवा
डेन्मार्क-हॉलंडमध्ये असे समूह अनेक ठिकाणी आढळतात. मात्र ही सगळी घरे एकाच
वेळी वापरात होती का पुन्हापुन्हा नव्याने बांधीत याविषयी निश्चित माहिती
नाही. कारण गृहसमूहांना आनुषंगिक अशा रस्ते किंवा सरंक्षणयोजना कोठेच दिसत
नाहीत. त्या पुढे आल्या.
जीविताच्या इतर शाखांप्रमाणे याही क्षेत्रात
नवाश्मयुगात क्रांतिकारक बदल झालेले दिसतात. नव्या जीवनपद्धतीत स्थिर
वस्ती ही समाजाची गरज झाल्याने जास्त टिकाऊ निवासस्थाने आवश्यक झाली.
स्वाभाविकच चिवट व बळकट सामान कौशल्याने वापरण्यात येऊ लागले. लव्हाळे,
बांबू, कातडी यांच्या ऐवजी आता मोठाले लाकडी ओंडके, दगड, कच्च्या विटा
यांचा उपयोग होऊ लागला. नवाश्मयुगीन निवासस्थानांत स्थलकालपरत्वे खूपच
वैविध्य आढळते. घरांचा आराखडा आता गोल, चौरस वा आयत अशा आकारांचा झाला.
मध्याश्मयुगातही भिंत हा घटक फारसा कोठे आढळत नाही. आता बांबूच्या-वेताच्या
तट्ट्यापासून, दगड, कच्च्या विटा यांच्या बांधलेल्या अशा सगळ्या
प्रकारच्या भिंती दिसून येतात. या भिंतींवर गिलावा करून त्यावर रंगकामही
केलेले आढळते (जार्मो). भिंती भक्कम करण्यासाठी त्यांखाली दगडी जोती
ठेवण्याच्या प्रथेचाही आरंभ झालेला दिसतो (जार्मो). भोवतालच्या जमिनीपेक्षा
घराची जमीन थोडीशी खोलगट करण्याची प्रथा आताही बऱ्याच भागांत चालूच
राहिली. छपराचे स्वरूप मुख्यत्वे बांधकामाची साहित्यपद्धती व पर्जन्यमान
यांवरच अवलंबून राहिले. पावसाळी भागात लाकडी उतरती वा दगड-विटा यांची
घुमटाकार व इतरत्र सपाट अशी छपरे इमारतींवर असत. ⇨जेरिको (पॅलेस्टाइन),
खिरोकिटिया (सायप्रस), हसौना (उ. मेसोपोटेमिया) हे अवशेषांचे त्याबाबतचे
नमुने होते. कालांतराने घरांमध्ये एकच दालन ठेवण्याऐवजी त्याच्या खोल्या
पाडण्यात येऊ लागल्या. सायप्रसमधील खिरोकिटिया येथील वर्तुळाकार घरात
पोटमाळा काढलेला होता. त्याला पक्क्या खांबांचा आधार होता, तरीही जिना
मात्र पक्का नव्हता. तेथे साध्या शिडीचाच उपयोग केलेला असावा. उपलब्ध
जागेच्या विभाजनाचा हा एक स्वतंत्र व फारसा रूढ न झालेला प्रकार. खोल्यांची
कल्पना रुजल्यावर कित्येक ठिकाणी समोर ओवरी, त्यामागे एकापाठोपाठ एक अशा
दोन खोल्या, अशीच मांडणी हलाफ (सिरिया) येथील अवशेषांवरून दिसते. यापुढे
हसौना येथे एका उघड्या चौकाभोवती अनेक खोल्या मांडलेल्या दिसतात. सर्व
खोल्यांना हवा व उजेड पोचण्यास ही योजना उपयुक्त होती, तसेच सगळ्यांभोवती
एक मोठी भिंत असल्याने सगळे घर सुरक्षित राही. आर्पाकिया (उत्तर इराक) या
ठिकाणी घरांची थोडी निराळी रचना सापडते. वर्तुळाकार रचनेचीच ही थोडी
सुधारलेली आवृत्ती असावी. या घराचे दोन भाग दिसतात. एक वर्तुळाकार दालन व
त्याच्या समोर आयता- कार दालन दिसते. या दालनाला प्रवेशद्वार असावयाचे. पण
हा आराखडा अपवादात्मक होय. एरवी गृह-
रचनेच्या विद्येतील सर्व मूलभूत
घटक–वास्तुसाहित्य, वास्तुरचना, तंत्र, वास्तुविधान व सुशोभन–नवाश्म-
युगीनांनी आत्मसात केलेले दिसते. वास्तुविद्येची ही सर्व प्रगती मुख्यत्वे
पॅलेस्टाइन, तुर्कस्तान, इराक या भागांत व भूमध्य समुद्रातील काही बेटांत
झाली, हे ध्यानात घ्यावयास हवे. कारण साधारणत: याच भागात नवाश्मयुगीन
संक्रमण सिद्धीस पोचले असावे, असे समजतात.
यूरोप, चीन, भारत व ईजिप्त
या ठिकाणी नवाश्मयुगीनांनी बांधलेली घरे बरीचशी निराळी आहेत. यूरोप- मध्ये
गृहरचनेस लाकडाचाच उपयोग होत गेला. आयताकार वा चौरस घरे भक्कम लाकडी किंवा
बांबूच्या सांगाड्याभोवती बांधीत. भिंती आणि बहुधा छपरेही फळ्यांची केलेली
असत. क्वचित त्यांवर गवत पसरीत (फेडर्झे, कोलोन-लिंडन्थॉल), ईजिप्तमध्ये ⇨
फायूम येथे बांबू व तट्ट्या यांच्या झोपड्या वापरीत असावेत असे दिसते.
यानंतरच्या मेरिम्डीयन समाजाने अशा झोपड्यांची छपरे घुमटाकार बनवून त्यांवर
चिखल थापण्यास आरंभ केला. चीन व भारत या दोन्ही ठिकाणी सामान्यपणे लाकूड व
गवत यांच्या वर्तुळाकार वा चौकोनी झोपड्या वापरलेल्या दिसतात
(टेक्कलकोटा). क्वचित प्रस्तरालयाचाही आश्रय केलेला होता. परंतु चीनच्या
शान्सी व भारताच्या काश्मीर भागात खड्ड्यांत केलेली घरे या काळात वापरीत.
आंतराश्मयुगात
काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा
जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार,
म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा
अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग
हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्याच मोठ्या कालखंडात रस्ता ही
कल्पना ज्ञात नव्हती. दोन घरांच्या मध्ये उरणाऱ्या जागेतूनच दळणवळण चाले.
हे सोयीचे करण्याचे प्रयत्न क्वचित काही ठिकाणी झालेले दिसतात. आर्पाकिया
येथे अशा वाटांवर दगड अंथरले होते, तर खिरोकिटिया येथे मुख्य रस्त्यावर
फरसबंदी केलेली होती. परंतु ही उदाहरणे अपवादात्मक होत. यूरोपातील काही
वसाहतींत (फेडर्झे) घरे एका ओळीत बांधून मध्यभागी हेतुत: रस्ते ठेवलेले
दिसतात. इतरत्र अशी योजनापूर्वक मांडणी सापडत नाही. वाहने नसल्याने
खेड्यांना एकमेकांशी जोडणारे रस्ते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती.
खेड्यांच्या रक्षणासाठी काही बांधकाम करण्याची व्यवस्था नवाश्मयुगात प्रथम
झाली. इ.स.पू. आठव्या सहस्रकात जेरिको येथे एक प्रचंड दगडी तटबंदी
उभारण्यात आली होती. पण हेही एकुलते एकच उदाहरण आहे. नवाश्मयुगाच्या अगदी
शेवटी शेवटी भूमध्य सागराभोवतालचा प्रदेश व पश्चिम आशिया या भागांतील काही
ठिकाणी विटांच्या तटबंद्या बांधण्यात आल्या (मर्सीनू, हसितकार, ट्रॉय).
उत्तर व मध्य यूरोपातील वसाहतींभोवती लाकडी तटबंद्या व खंदक आढळले आहेत
(कोलोन-लिंडन्थॉल). फ्रान्समध्ये काही टेकड्यांच्या माथ्याभोवती असणाऱ्या
दगडी भिंती याच काळातील समजतात. ही सर्व उदाहरणे फुटकळ आणि काळ व स्थळ या
दोन्ही दृष्टींनी एकमेकांपासून दूरची आहेत. म्हणून ग्राम अस्तित्वात आले,
तरी ग्राम-योजना व ग्राम-संरक्षण या कल्पनांचे आकलन झाले होते किंवा त्या
रुजल्या होत्या, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
दळणवळणासाठी वाहने
वापरली जात असल्याची शक्यता असली, तरी प्रत्यक्षात वाहने होती किंवा कसे
आणि असल्यास त्यांचे स्वरूप काय असावे, हे सांगता येत नाही. प्राणी
माणसाळविलेले असल्याने ओझे लादून नेण्यास वा बसून जाण्यास उपयोगी होत
असावेत. उत्तरपुराणाश्मयुगात होड्या करता येऊ लागल्या होत्या. नदीत अगदी
थोड्या अंतरावर जाऊन मच्छीमारीसाठी त्यांचा वापर होई. नवाश्मयुगात होड्या
होत्याच. त्यांचा आकार थोडा वाढला होता. या काळाच्या शेवटी कदाचित शिडीही
वापरण्याची विद्या मानवाला साध्य झाली असावी. मात्र ही प्रगती पूर्णपणे
स्थानिक होती. ती नाईल नदीवरील प्रवासापुरतीच मर्यादित होती.
हत्यारे
व आयुधे:
आपल्या अंगातील नैसर्गिक शक्तीला भोवतालच्या पदार्थांची जोड देऊन
स्वत:ला अधिक कार्यक्षम बनविणे हा कोणत्याही मानवी तंत्रज्ञानाचा प्राथमिक
उद्देश असतो. अश्मयुगात मानवाने लाकडे, हाडे व मुख्यत: दगड यांचे साहाय्य
घेतले. त्यापासून आपल्या उपयोगी पडतील अशी उपकरणे व आयुधे घडविण्यास त्याने
आरंभ केला. किंबहुना उपकरणे व आयुधे वापरण्याची बुद्धी व ती तयार करण्याची
शक्ती ही मानवाची व्यवच्छेदक लक्षणे समजावी लागतात. अश्मयुगातील
तंत्रविषयक प्रगतीच्या दिशा पुढीलप्रमाणे होत : एखाद्या विशिष्ट कामाला
विशिष्ट आकाराचीच उपलब्ध वस्तू (दगड) जास्त उपयोगी पडते ही जाणीव त्यास
झाली. ही जाणीव एकाएकी प्राप्त न होता अनुभवातूनच उत्पन्न होते. त्यामुळे
विशिष्ट आकाराच्याच दगडांची निवड करून, हव्या त्या आकारांचे दगड न
मिळाल्यास, जे दगड हाताशी असतील त्यांना मनाजोगता आकार देण्यास त्याने
सुरुवात केली.यासाठी दगडाचे टवके व तुकडे उडविणे व योग्य आकार देणे त्यास
क्रमप्राप्तच होते. पूर्णपुराणाश्मयुगाच्या आरंभापासूनच येथपर्यंत त्याने
मजल मारलेली दिसते.दगडाचा आकार जसा निवडता आला, तसाच त्याचा प्रकारही मानव
निवडू लागला.ठिसूळ
दगडांचे आडवे कातळ निघू शकतात, हेही ज्ञान त्यास
होऊ लागले. त्याचप्रमाणे तो उपकरण-प्रकाराला जास्त अनुकूल असा दगडाचा
प्रकारच निवडू लागला. पुराणाश्मयुगाच्या मध्य व उत्तर खंडांत त्यास अशी
पारख पूर्णत्वाने प्राप्त झालेली दिसेत. लहान आकाराचे छिलके व पाती यांसाठी
चर्ट (Chert), ॲगेट (Agate) असे अत्यंत घट्ट व एकसंध पाषाणप्रकार त्याने
निवडलेले दिसतात. निवडलेल्या पाषाणप्रकारांतून अपेक्षित आकार घडविण्याच्या
पद्धतींत पुढे वैविध्य आले व प्रगती झाली. बदामी आकारचे व बहुविध
उद्योगांचे ‘हातकुऱ्हाड’ नावाचे हत्यार तयार करण्याच्या दोन पद्धतींवरून हा
मुद्दा जास्त स्पष्ट होईल. अबेव्हिलियन पद्धतीत दगडाचे मोठाले टवके उडवीत,
त्यामुळे आयुध ओबडधोबडच राहत असे. अश्यूलियन पद्धतीत टवके उडवून हलकेहलके
इष्ट आकार घडवीत. त्यामुळे सलग व धारदार अशी कड व अणकुचीदार टोक तयार होई.
केवळ दगडाचे आयुध वापरण्याऐवजी त्याला लाकडी किंवा हाडाच्या दांड्याची जोड
द्यावी, हे ज्ञान त्यास होऊ लागले. दगडी हत्यार काठीला वा हाडाला बांधून
दांड्यात भोक पाडून त्यात दगड, किंवा दगडात भोक पाडून त्यात दांडा, तो
अडकवू लागला. दांड्याला खाचा पाडून त्यात तो दगड बसवू लागला. त्यामुळे
कुऱ्हाडी, विळे, बाण असे संयुक्त आयुध बनू लागले. उत्तरपुराणाश्मयुगापासून
पुढे संयुक्त आयुधे विशेष प्रचलित झालेली दिसतात. यासाठी दगडाच्या लहान
आकाराच्या छिलक्या व पाती तयार करण्यास या वेळेपासूनच प्रारंभ झाला होता.
आंतर व नव या दोन अश्मयुगांत या छोट्या पात्यांचा उपयोग करून हरतऱ्हेची
संयुक्त आयुधे बनविण्यात मानवास प्रावीण्य प्राप्त झाले. बाण, सुऱ्या,
विळे, खुरपी अशी अनेकविध उपकरणे आता तयार झाली. लहानलहान भाग एकत्र आणून
आयुध तयार करण्याची ही पद्धती पूर्वीच्यापेक्षा अधिक वेळ खाणारी व विशेष
कौशल्याची होती. परंतु यामुळे उत्पन्न झालेली आयुधे विविध प्रकारची तर
होतीच, पण कार्यक्षमही होती. उपकरणे वा आयुधे यांच्या निर्मितितंत्राची
उत्क्रांती विचारपूर्वक किंवा पूर्व- योजनेप्रमाणे झाली नाही. गरजा,
उपलब्ध सामग्री आणि परंपरागत ज्ञान यांच्या समन्वयातून ती होत गेली. उदा.,
पुराणाश्मयुगात मुख्यत: घातक आयुधे तयार झाली, तर नवाश्मयुगात शेतकी
व्यवसायाला उपयोगी अशी विळा, खणण्याची काठी ही अवजारे तयार होत होती.
क्षेपणायुधांत भाला, भालाफेकीची काठी, बोला, धनुष्यबाण व गोफण ही सर्व
प्राणघातक आयुधे होती. मुख्यत: शिकारीसाठी वापरण्यात येणारे आयुध म्हणजे
भाला. टोकदार काठी हेच भाल्याचे पहिले रूप होय. टोक भाजून, टणक करून,
टोकाला दगडी फाळ लावून ते केलेले असे. हे भाले जास्त दूरवर फेकता यावेत
म्हणून त्यांच्या एका टोकाला उंचवटा असणारी काठी उत्तरपुराणाश्मयुगात काही
ठिकाणी वापरात आली. तीनचार कातडी वाद्यांच्या टोकांना गोल गोटे बसवून
त्यांची दुसरी टोके एकत्र बांधलेले आयुध म्हणजे ‘बोला’. आपल्या डोक्यावर ते
गरगर फिरवून जोराने भिरकावून दिले, की चक्रासारख्या फिरणाऱ्या या
गोट्यांच्या तडाख्यात एखादा मोठा पक्षी सापडे किंवा त्यात श्वापदाचे पाय
गुंतून ते हाती लागे. धनुष्यबाणाच्या उपयोगास आंतराश्मयुगापासून आरंभ झाला
असावा. धनुष्याला कातडी वादी लावीत. बाणाला दगडाची किंवा हाडांची टोके
बसवीत. गोफण हे एक प्रभावी क्षेपणायुध नवाश्मयुगात गवसले. त्यास दगड नसले
तर मातीचे भाजून पक्के केलेले गोळे वापरीत असत. लाकडे व हाडे यांचा
स्वतंत्र उपकरणांच्या निर्मितीसाठीही उपयोग केलेला आढळतो. लाकडाची हत्यारे
कालौघात बव्हंशी नष्ट झाली तरी भाला, भालाफेकीची काठी, धनुष्यबाण व
खणण्याची काठी ही महत्त्वाची अश्मयुगीन अवजारे लाकडीच होती, हे निश्चित.
हाडे व शिंगे यांजपासून बनविलेल्या अनेक वस्तू आजही टिकून राहिल्या आहेत.
त्यांत प्रामुख्याने बाणांची टोके, मासेमारीसाठी छोटे काटेकारी बाण, गळ,
सुया, दाभणे यांचा समावेश होतो. ह्यांपैकी काही वस्तूंची निर्मिती जरी
उत्तरपुराणा-श्मयुगात होऊ लागली असली, तरी त्यांतील वैविध्य व कौशल्य
आंतराश्मयुगातच पाहावयास मिळते. या काळातच हस्तिदंताच्याही वस्तू बनविण्यात
येऊ लागल्या.
अग्नी :
तांत्रिक विद्यांच्या बरोबरीने अग्नीचेही
मानवाला मोठे साहाय्य झाले आहे. अश्मयुगातील सर्वांत प्राचीन असे
मानवसंबद्ध अग्नीचे अवशेष चीनमधील जोकोत्येन येथील गुहांत मिळाले आहेत.
यदृच्छया निर्माण झालेला अग्नी तसाच तेवत ठेवण्याची कला जोकोत्येनच्या
रहिवाशांना माहीत असावी. पुढे अश्म- युगाच्या विविध खंडांत सर्वत्र मानवाने
अग्नीचा सतत उपयोग केलेला दिसतो, मात्र तो अग्नी त्याने उत्पन्न केला, की
वणव्यासारख्या आगीची धग टिकवून धरली, हे सांगता येत नाही. लाकडे, हाडे
किंवा क्वचित कोळसा (पॅलेस्टाइन) या कामाला सर्पण म्हणून वापरलेला असे.
अग्नी निर्माण करण्याची विद्या उत्तरपुराणा- श्मयुगात साध्य झाली असण्याची
शक्यता आहे. आंतराश्मयुगात व नवाश्मयुगात ती नक्कीच हस्तगत झाली होती.
गारगोटी व लोखंडाचा अंश असलेला दगड यांच्या घर्षणातून अग्नी उत्पन्न करीत.
अग्नीचा उपयोग कृत्रिम रीत्या उष्णता व उजेड निर्माण करणे, कच्चे मांस
भाजून खाणे, जनावरांची चरबी दगडी दिव्यात घालून वाती जाळणे, जनावरांना
घाबरवून स्वत:चे रक्षण करणे, काठ्यांची व हाडांची टोके भाजून ती टणक करणे
इत्यादींसाठी होत असे. आंतराश्मयुग व नवाश्मयुग यांत अग्नीचा सुटसुटीतपणे
वापर करता यावा म्हणून शेगड्या, चुली, भट्ट्या तयार करण्यात आल्या होत्या.
स्वयंपाकाबरोबरच, मातीच्या मूर्ती अथवा भांडी भाजणे यांसाठीही नवाश्मयुगात
अग्नीचा वापर झाला. अशा भट्ट्या काही नवाश्मयुगीन वसाहतींच्या अवशेषांत
मिळाल्या आहेत.
उपकरणे, भांडे इ. :
पुराणाश्मयुगातील व
आंतराश्मयुगातील अत्यंत अस्थिर आणि भटके जीवन लक्षात घेता, मानवाला काही
साठवणाची गरज भासली असेल, असे वाटत नाही. साठवून ठेवण्यासाठी वेळ अथवा निकड
त्याला भासावी असे पदार्थही त्या वेळी त्याच्याजवळ नव्हते.
उत्तरपुराणाश्मकालीन गुंफांतील चित्रकारांनी वापरलेले दगडी दिवे सोडले, तर
अन्य कसलेही भांडे ज्ञात नाही. पुढे नवाश्मयुगाच्या पूर्वार्धात जेरिको,
जार्मो येथील माणूसही फक्त दगडीच भांडी वापरीत होता. यांत कटोरे, पेले असे
काही प्रकार आढळतात. दगडी भांड्यांच्या घडणीत व सजावटीत थोडा फरक
स्थलकालपरत्वे आढळतो. उदा., सायप्रसमधील खिरोकिटिया येथील भांडी घासून
घासून झिलईदार करण्यात येत. परंतु त्यांच्या आकारात फारसे वैविध्य नाही.
दगडाप्रमाणेच लाकडी ठोकळे कोरून त्यापासून भांडी तयार करण्यात येत असतीलही,
परंतु त्यांचे आज अवशेष नाहीत.
नवाश्युगाच्या पूर्वार्धापर्यंत
मृत्पात्रे करण्याची विद्या मानवाला हस्तगत झालेली नव्हती. नवाश्मयुगाच्या
मध्यापासून अशी भांडी बनविण्याला आरंभ झाला. निदान पश्चिम आशिया व भूमध्य
समुद्राभोवतालचा प्रदेश यांपुरते तरी हे विधान निश्चित पुराव्यांवर
आधारलेले आहे. मृत्पात्रे तयार करण्याची विद्या केवळ याच लोकांना साध्य
झाली, असे समजण्याचे कारण नाही. तिचा उगम निरनिराळ्या ठिकाणी स्वतंत्रपणेही
झाला असेल. तद्वतच ती याआधीही कोणा समाजाला साध्य झाली असेल. पण प्रत्यक्ष
आधाराने सांगता येते, ते फक्त पश्चिम आशियाविषयी. या कलेचा उगम कसा झाला
याविषयी जी अनेक मते प्रचलित आहेत, त्यांत जास्त ग्राह्य अनुमान असे, की
आधीपासून वापरात असणाऱ्या बांबूच्या टोपल्यांना माती लिंपण्यास आरंभ झाला.
एखादी अशी टोपली केवळ योगायोगाने जळाली असावी व लिंपलेल्या मातीचे झालेले
तुकडे हाती लागले. अशा अपघातातून मातीच्या दोन गुणांचा शोध लागला. ते
म्हणजे–मनाजोगता आकार देता येणे व भाजूण काढले तर तो आकार पक्का
होणे. याच माहितीचा उपयोग करून मृत्पात्रे करण्यास आरंभ झाला. भांडी
करताना, त्यांना आधीपासून दगडी-लाकडी भांड्यांना देण्यात येणारे वाडगे,
कुंडे यांसारखे आकार तर दिलेच पण ठेवरेवीला, विशेषत: पाणी व तत्सम
द्रवपदार्थ यांच्या ने-आणीला, जास्त उपयुक्त अशी लहान तोंडाची भांडीही तयार
करण्यात येऊ लागली. भोपळा, नारळ अशांसारख्या फळांवरून हे आकार सुचले
असावेत. कदाचित या फळांच्या कवचांचा असा उपयोग यापूर्वीही केला जात असावा.
लवकरच या भांड्यांना रंग लावून व त्यांवर नक्षी उमटवून ती सुशोभित
करण्यासही सुरुवात झाली असावी. यापुढे निरनिराळे आकार, भांडी घडविण्याच्या
पद्धती यांचे शोध लागत गेले. चाकाचा शोध लागला अधिक प्रमाणबद्ध व डौलदार
भांडी तयार होऊ लागली. भांडी भाजण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या भट्ट्याही
वापरात आल्या. परंतु हा सर्व पसारा नवाश्मयुग व ⇨ताम्रपाषाणयुग यांच्या
संधिकालातीलच आहे.
बांबू, लव्हाळे व वेत एकत्र गुंफून, मासे
पकडण्यासाठी खूप मोठाल्या टोपल्या आंतराश्मयुगीन यूरोपात (डेन्मार्क –
एर्टेबोल संस्कृती) वापरीत. याच्या पुढची पायरी म्हणजे चटया विणणे आणि
शेवटी घरगुती उपयोगाच्या लहानमोठ्या टोपल्या, दुरड्या विणणे ही होय.
पॅलेस्टाइनमधील जेरिको व जार्मो आणि ईजिप्तमधील फायूम यांसारख्या ठिकाणच्या
नवाश्मयुगीन थरांत मातीवर उमटलेल्या ठशांच्या स्वरूपात टोपल्या व दुरड्या
यांचे अवशेष पाहावयास सापडतात. यांग-शो या चिनी नवाश्मयुगीन समाजास
बुरूडकाम अवगत होते. अमेरिकेतील बुरूडकामाचा पुरावा साधारण पॅलेस्टाइनइतकाच
इ.स.पू. सातव्या सहस्रकातील असून दक्षिण अमेरिकेतील बुरूडकाम अत्युकृष्ट
दर्जाचे समजले जाते.
धर्म :
पुराणाश्मयुगातील व आंतराश्मयुगातील
धार्मिक जीवनात मुख्य साधन म्हणजे गुहांतील चित्रे होत. ह्या गुहा मंदिरे
वा प्रार्थनास्थळे म्हणून वापरण्यात येत असत. नवाश्मयुगात प्रथमच मंदिर
किंवा प्रार्थनास्थान उभारलेले दिसते. मध्याश्मयुगातील व्हिस्टोनीसचे
पुरोहिताचे घर सोडले, तर यापूर्वीच्या काळातील धार्मिक स्वरूपाची कोणतीच
वास्तू मिळालेली नाही. जेरिका येथील मंदिरे आयताकार होती. क्वचित त्यांच्या
समोर एक ओवरी आणि एक छोटासा मंडपही दिसतो. दारासमोरच्या भिंतीत कोनाडा
करून त्यात दगडी खांब वा मूर्ती ठेवती. आर्पाकिया येथे एक प्रशस्त घुमटाकार
मंदिर आहे. गाभारा गोल (व्यास ९ मी.) व त्यासमोर आयताकार मंडप (लांबी १८
मी.) आहे. दोन्ही ठिकाणी घराचीच रचना थोड्याफार फरकाने मंदिरासाठी वापरलेली
आहे, हे स्पष्ट दिसते. तुर्कस्तानातील नवाश्मयुगीन अवशेषांत (कटाल हयुक)
हीच गोष्ट अधिक स्पष्ट दिसते. तेथील मूर्तिकाम, भिंतीवरील चित्रे व शिल्पे
यांमुळे या वास्तू धार्मिक उपयोगाच्या असाव्यात हे कळते. त्या वेळी धार्मिक
वास्तूंना काहीं ठळक वैशिष्ट्ये प्राप्त झाली असावी, हे उब्राइड
संस्कृतीच्या अवशेषांवरून स्पष्ट होते (एरिडू व टेपे गौरा). आयताकार
दालनाच्या एका टोकाला मूर्तीचे पीठ अथवा स्थंडिल आहे. बाहेरून जोते बरेच
उंच ठेवीत. अनेक भित्तिस्तंभ किंवा क्षेपप्रतिक्षेप आहेत. सुमेरियन काळातील
⇨झिगुरातसारख्या मंदिराच्या वास्तूंच्या रचनावैशिष्ट्यांचा उगम येथे
पाहावयास सापडतो. ह्याशिवाय दगडी, मातीच्या वा हाडाच्या मूर्ती आणि थडगी
यांवरूनही धार्मिक जीवनासंबंधी बरीच माहिती मिळते. त्याच्या धार्मिक कल्पना
निश्चितपणे काय होत्या, ह्याविषयीचा कसलाच स्पष्ट पुरावा आज मिळत नाही.
तसेच वैयक्तिक व सामाजिक स्मृतींतून निर्माण होणाऱ्या दंतकथा व परंपरा
यांचीही माहिती आपल्याला नाही. मात्र पुरोहिताचे स्थान काय व तो काय कामे
करीत असावा, याची थोडीफार कल्पना येते पण त्याच्या शक्तीचे गूढ समजत नाही.
जारणमारण
यांसारख्या तंत्रांवर लोकांचा त्या वेळी विश्वास होता. एखाद्या जनावराच्या
छोट्या प्रतिकृतीवर बाण लागल्याचे चित्र काढले, की तो प्राणी शिकारीत सहज
हाती लागेल अशी कल्पना होती. फ्रान्स व स्पेन येथील अनेक गुहांत अशी
कितीतरी चित्रे सापडतात. भालाफेकीच्या काठीवरील कोरीव चित्रेही याच
उद्देशाने काढलेली असावीत. केवळ शिकारीवरच अवलंबून असणाऱ्या माणासाने
आपल्या व्यवसायात अतिमानुषी शक्तींचे अशा तऱ्हेने साहाय्य मिळविण्याचा यत्न
करावा हे स्वाभाविक वाटते. दुसरे तत्त्व म्हणजे जननतत्त्व होय. या
तत्त्वाची आराधना करण्यात येत असल्याचा पुरावा अनेकविध स्वरूपांत सापडतो.
वर उल्लेखिलेल्या मातृका-मूर्ती या त्यांतील प्रधान अवशेष होत. समागम
करणाऱ्या पशूंच्या मूर्तीत हाच आशय आहे. एतद्विषयी काही क्रियाकर्मे (विधी)
होत असावीत, असे फ्रान्समधील गुहेत असणाऱ्या पूर्णाकार नग्न
स्त्रीमूर्तीवरून वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट मरणोत्तर जीवनाविषयीची
असून त्यात ‘आत्मा अमर आहे’ ही कल्पना पूर्वी पूर्वपुराणाश्मयुगातही मूळ
धरून असावी. या कल्पनेच्या दोन पायऱ्या दिसतात. एक मृतात्म्याचा प्रवास व
दुसरी पुनर्जन्म आणि तोही शक्यतो मानवी स्वरूपात दर्शविला आहे. यूरोपात
सापडलेल्या निअँडरथल मानवाच्या थडग्यांतून अन्न, हत्यारे व क्वचित दागिनेही
त्याच्या भोवती पुरलेले दिसतात. अन्न व हत्यारे ही त्याच्या मरणोत्तर
जीविताची शिदोरीच होय. थोड्या नंतरच्या काळात पुरलेल्या प्रेतांचे पाय
पोटाशी दुमडून घेतलेले आहेत. यांत आईच्या पोटात मूल याच अवस्थेत असते, हे
प्रामुख्याने दाखवावयाचे असून पुनर्जन्माची प्रतीक्षा करणारा हा जीव
भूमातेच्या पोटात त्याच अवस्थेत पुरण्यात येत असे. गुहेच्या जमिनीत किंवा
क्वचित झोपड्यांच्या जमिनीखाली मृताला पुरण्यात येत असे. यावरून हा
मृतात्मा घरादारांचे रक्षण करण्यासाठी तेथे ठेवीत, असा निष्कर्ष काही तज्ञ
काढतात. गणचिन्हासंबंधीही अश्मयुगीन मानवाच्या काही विशिष्ट कल्पना होत्या.
एखाद्या प्राण्याच्या अगंच्या काही विशेष शक्तींमुळे वा गुणांमुळे त्याला
महत्त्व प्राप्त होऊन तो एकेका गटाचा वा कुलाचा पालक बनत असे आणि त्याची
प्रतिकृती ही त्या गटाचा ध्वज किंवा निशाणी समजली जाई. ही निशाणी पतकरताना,
त्या प्राण्याचे अतिमानुषी बल आपल्या पाठीशी सतत अभे राहावे, ही कल्पना
त्यामागे असावी.
नवाश्मयुगात शिकारीचे महत्त्व ओसरले. साहजिकच त्यात
यश मिळविण्यासाठी जादूटोण्याची गरजही आता सरली. तथापि पूर्वीच्या काही
समजुती थोड्याफार फरकानिशी पुढे चालूच राहिल्या. त्यांपैकी मातृकामूर्ती
नवाश्मयुगीन अवशेषांत फार मोठ्या प्रमाणावर सापडतात. जननक्रियेतील
स्त्रीतत्त्वाचे पूजन या स्वरूपात होत राहिले, तसेच आता पुरुष तत्त्वाचेही
पूजन सुरू झाले असावे. भूमध्य सागराभोवतीच्या प्रदेशातील कुऱ्हाडपूजा ही
लिंगपूजेशी निकट समजली जाते. शिवाय पुरुषतत्त्वाची आराधना कबुतर व वृषभ या
रूपांत करण्यात येई. मृतात्म्याची व्यवस्था अधिक बारकाईने करण्यात येऊ
लागली. केवळ खड्डा करून त्यात प्रेत गाडण्याऐवजी आता रचनापूर्वक बांधलेली
थडगी दिसू लागली. काही भागांत मोठी दगडी थडगी वा शवपेटिका वापरण्यात येऊ
लागल्या होत्या. कदाचित डामडौलाचा व वैभवाचा निदर्शक असा हा भाग समजता
येईल. बहुतेक थडग्यांतून मातृकामूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. या मूर्ती
म्हणजे पूर्वी अभिप्रेत असणाऱ्या पृथ्वीमातेची मूर्त रूपे होत. खास
नवाश्मयुगात उत्पन्न झालेला धार्मिक घटक म्हणजे नैसर्गिक शक्तीची
(पंचमहाभूतांची) उपासना करणारा घटक होय. यापुढे शेती करू लागणाऱ्या
समाजांना वार्षिक ऋतुचक्राची कल्पना यावयास लागलेली दिसते. त्यातूनच शेतीस
उपयोगी पडणाऱ्या सूर्य व पाऊस या दोन देवतांची उपासना मूळ धरू लागली असावी.
यांची मूर्त स्वरूपात पूजा होण्याऐवजी त्यांच्या स्थित्यंतराचे व
गमनागमनाचे प्रसंग सामुदायिक उत्सवरूपाने साजरे होऊ लागले. दुसरीकडे
जननतत्त्वाचा आवाका वाढून पूर्वीप्रमाणे माणसे व पशू यांच्या
प्रजोत्पादनाबरोबर किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची म्हणून जमिनीची
सुपीकता त्यात समाविष्ट झाली. या समजुतींतून निर्माण झालेल्या वेगवेगळ्या
देवदेवतांची पूजा-अर्चा व प्रार्थना यांसाठी वर सांगितलेली मंदिरे
उभारण्यात आली असावीत.
या सर्व समजुती, उत्सव, कल्पना ह्यांतून उत्तरनवाश्मयुगीनांना त्यांच्या पुराणकथा, दंतकथा-धर्म मिळाला असावा.
अलंकरण,
कला इ. :
उपजीविका कष्टसाध्य आणि एकूण जीवन अस्थिर असले, तरी मानवाची उपजत
सौंदर्यदृष्टी व अभिरुची निरनिराळ्या प्रकाराने व्यक्त झालेली दिसते.
त्यांतला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार म्हणजे अलंकरण. आपले शरीर सुशोभित
करण्याची तीव्र इच्छा मानवाला सतत आहे. यासाठी चित्रविचित्र रंगांचे विलेपन
ही सगळ्यात आरंभीची पायरी होय. अश्मयुगातील काही सांगाडेही गेरूने
रंगविलेले आहेत. त्यांवरून अश्मयुगीन माणूस अंगाला रंग लावीत असावा, असा
कयास करता येतो. दुसरा प्रकार म्हणजे, प्राण्यांची हाडे, दात, नखे किंवा
वाळक्या बिया यांना भोके पाडून त्यांच्या माळा करून गळ्यात घालणे हा होता.
आंतराश्मयुगीन अवशेषांत असे ताइतासारखे वापरलेले दात व हाडे खूप सापडतात.
तिसरा प्रकार म्हणजे रंगीत वा चमकदार दगड घेऊन त्यांचे मणी, लोलक आणि ताईत
तयार करणे व त्यांच्या माळा अंगाभोवती गुंडाळणे हा होता. चंद्रकोरीच्या,
कुऱ्हाडीच्या किंवा पक्ष्याच्या आकाराचे ताईत सापडतात. पण बहुतेक ताईत हे
तोड्याच्याच स्वरूपाचे समजावयास हवेत. नवाश्मयुगात दगडी मणी आणि ताईत यांचे
विविध प्रकार पाहावयास मिळतात. अलंकारांकडे इतके लक्ष होते, की
वस्त्रप्रावरणाकडे विशेष लक्ष देण्याची अश्मयुगीन माणसाला जरूरच भासली
नसावी, इतका पुरावा मिळतो. अश्मयुगातील वस्त्रांचे प्रत्येक्ष अवशेष उपलब्ध
नाहीत. माणसाचे पहिले चित्र उत्तरपुराणाश्मयुगातीलच पाहावयास मिळते. या
चित्रणातून तो सहसा वस्रहीनच दिसतो. क्वचित काही मूर्तींवर (पूर्व यूरोप)
केसाळ असे कपडे दाखविले आहेत. त्यावरून अतिशीत प्रदेशात जनावरांची कातडी
लपेटून घेण्यात येत, पण इतरत्र वस्त्रांची जरूर भासत नव्हती. ही वस्त्रे
शिवण्यासाठी वा ती बांधून घेण्यासाठी उपयोगी असे भोके पाडण्याचे दगडी टोचे व
हाडांची दाभणे अवशेषांत मिळतात. जनावरांच्या केसांचा (लोकरीचा) कपड्यासाठी
विणून उपयोग करीत किंवा काय, ते सांगता येत नाही.
गवताचे व
अंबाडीसारख्या वनस्पतीचे धागे एकत्र विणून दोर तयार करीत. या दोरांचा उपयोग
धन्युष्यांसाठी किंवा मासेमारीची जाळी विवण्यासाठी होत असे. सूत कातण्यास
आरंभ नवाश्मयुगातच झाला. अवशेषांत चातीची, मातीची वा दगडी चाके मिळाली
आहेत. तसेच मातीवर उमटलेले कापडाचे ठसे पॅलेस्टाइन व ईजिप्त येथील काही
अवशेषांत मिळाले आहेत. इतरत्र अद्यापही चामड्याचेच कपडे वापरात असावेत. या
अवशेषांतील मृत्पात्रांवर घागरा व जाकीट किंवा उपवस्त्र अशी दोन वस्त्रे
काढलेली आढळतात. त्यांना गुंड्याही लावल्या आहेत. विणकाम व शिवण यांविषयीची
अधिक माहिती नाही.
या प्रदीर्घ काळातील चित्रकला व मूर्तिकला यांचे
अनेक नमुने आज उपलब्ध आहेत. यूरोप, आफ्रिका व आशिया हा तिन्ही खंडांत ते
सापडतात. यांपैकी यूरोपात व आफ्रिकेत पूर्वपुराणाश्मयुगापासून थेट
नवाश्मयुगापर्यंतच्या कलाकृती आहेत, तर आशियात सामान्यपणे आंतराश्मयुगीन
कलाच दिसते. खुद्द नवाश्मयुगातील कलाकृतींचे प्रकार व त्यांची परंपरा
पूर्णत्वे भिन्न आहे. पूर्वपुराणाश्मयुगातील चित्रकलेचे सर्वोत्तम नमुने
फ्रान्स व स्पेन देशांतील गुहांतून सापडले आहेत. ही चित्रे गुहांत खूपच
खोलवर, अगदी आतल्या भागांत काढलेली आहेत. उत्तरपुराणाश्मयुग व आंतराश्मयुग
यांतील चित्रे जवळपास उघड्यावर असणाऱ्या दरडी व प्रस्तर यांवरच काढली आहेत.
चित्रांच्या बाह्याकृती टोकदार दगडाने कोरून, पृष्ठभागावर उमटविलेल्या
आहेत. यानंतर या आकृतींवर कुंचले किंवा फवारे यांनी रंग भरलेले आहेत.
कुंचले बांबूच्या पट्ट्या किंवा काठ्यांची टोके ठेचून तयार कलेले असावेत.
बहुतेक रंग नैसर्गिक रीत्या मिळतात तसेच वापरलेले आहेत. त्यांत मिश्रणाने
बदल करण्याचा यत्न केलेला दिसत नाही. रंग देताना वर्ण्यविषयांनी अनुरूप असे
स्वाभाविक रंग दिलेले आहेत. कित्येक वेळा रंग देण्याआधी खोदकाम करून
आकृतीला उठाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वचित माती थापून त्यातून
उठावाची चित्रे केली आहेत. भोवताली वावरणारे गवे, रानरेडे, हरिणे, घोडे
अशांसारखे प्राणी, प्राण्यांच्या शिकारींचे प्रसंग, नाच करणारे
स्त्रीपुरुष, धार्मिक विधी करणारा पुरोहित हे प्रमुख चित्रविषय होत.
स्पेनमधील काही गुहांतून वर्तुळे, चौकटी व तजन्य भौमितिक आकृत्या रेखाटल्या
आहेत. उत्तरपुराणाश्मयुग आणि आंतराश्मयुग यांमध्ये रंगीत चित्रांऐवजी
दगडाचा पृष्ठभाग खरवडून किंवा टाकी लावण्यासारखा ठोकून बाह्यकृती
उमटविण्यात येत असे. अशा चित्रांना बहुधा रंग दिलेला नाही. मूर्तिकलेचे
नमुने उत्तरपुराणाश्मयुगीनच आहेत. त्यांत हाडे, शिंगे व दगड यांवरील कोरीव
कामाचा समावेश करता येतो. भालाफेकी काठ्या, पुरोहिताच्या हातातील दंड,
यांवर अत्यंत वास्तवपूर्ण उत्थित शिल्पे खोदली आहेत. जनावरांच्या
डोक्याच्या आकाराचे हाडांचे काही ताईतही मिळाले आहेत. दगडी कामांत
स्त्रीमूर्ती मुख्य असून त्या अर्धाकृतीच्या व पूर्णाकृतीच्या स्वरूपांत
आहेत. स्थूल शरीराच्या या मूर्तीचे नितंब, स्तन व जघनप्रदेश विस्तृत
दाखविले आहेत. स्त्रीच्या जननकार्याकडे लक्ष वेधविण्याचा कलाकाराचा प्रमुख
हेतू असावा. म्हणून यांना सामान्यपणे ‘स्त्रीमूर्ती’ म्हणत असले, तरी
‘मातृकामूर्ती’ म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. नवाश्मयुगातील अवशेषांत
चित्रकलेचे नमुने नाहीत. या कालखंडाच्या उत्तरार्धात मृत्पात्रांवर
काढण्यात आलेल्या नक्षीत वेलपत्त्या, पशुपक्षी, भौमितिक आकृत्या अशा विविध
आकृत्या असल्या, तरी या कामाचा चित्रकलेत समावेश करणे योग्य ठरणार नाही.
मातीच्या भाजून केलेल्या आणि हाडाच्या मूर्ती, यांतील प्राणिमूर्ती व
स्त्रीमूर्ती विशेष चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. यांतील स्त्रीमूर्ती
मातृका-परंपरेतीलच आहेत. पूर्वीप्रमाणे या मूर्तीचे डोकेही केवळ एका
गोळ्याने दाखवितात आणि नाकडोळेही कोरलेले नसतात.
पूर्वपुराणाश्मयुगातील
कलाकृती म्हणजे आपल्या भोवताली दिसणार्या वस्तूंची केवळ नक्कल व
प्रतिकृती नव्हे त्यांत निरनिराळे प्रसंग व परिस्थिती कल्पिली आहे.
माणसाच्या प्रतिभाविलासाचा हा सर्वप्राचीन आविष्कार होय. विशेषत: गुहेतील
चित्रकाम या दृष्टीने अत्यंत लक्षणीय समजावे लागते. मानवी बुद्धी व मन
यांची एक वेगळीच झेप त्यांतून प्रतीत होते. परंतु या सगळ्या कलाकृती
सौंदर्यनिर्मितीच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या नाहीत हे निश्चित.
त्यांत काही धार्मिक समजुती व कल्पना अंतर्भूत असाव्यात. किंबहुना
पुराणाश्मयुगकालीन धार्मिक कल्पना आणि समजुती यांच्या माहितीचे मुख्य साधन
म्हणजेच तत्कालीन चित्रकला होय [→प्रागैतिहासिक कला].
अश्मयुगीन इतिहासाच्या पाऊलखुणा
चंद्रपूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. प्राचीन काळातील अनेक पाऊलखुणा इथं आढळून येतात. त्यात आणखी भर पडली आहे, ती अश्मयुगीन खडकचित्रांची. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली या गावाजवळ अशी तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. महापाषाण युगात येथील भूभागावर मानव टोळ्या करून वास्तव्य करीत होते हे या संशोधनातून समोर आले आहे. "प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन आहे," असा दावा इतिहास अभ्यासक अरुण झगडकर यांनी केला आहे.
प्राचीन खडककलेचा वारसा सिंधू संस्कृती इतकाच पुरातन : गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ तब्बल ६० ते ७० कोरीव खडकचित्रं (Petroglyphs) आढळली आहेत. भारतातील प्राचीन खडककलेचा समृद्ध वारसा हा सिंधू संस्कृतीइतकाच पुरातन असून, त्याचे अनेक अवशेष महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. 'पेट्रोग्लिफ्स' ही प्राचीन खडककलेचा एक प्रकार आहे. यात खडकाच्या पृष्ठभागावर विविध रेषात्मक, चित्रात्मक आकृती कोरण्यात आलेल्या असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील वढोली गावाजवळ नुकत्याच सापडलेल्या अशाच प्रकारच्या पेट्रोग्लिफ्समुळं या भागात एक नवा पुरातत्त्वीय संदर्भ पुढं आला आहे.
प्राचीन काळात मानवी वस्ती असण्याची शक्यता : वढोली हे गाव विदर्भाच्या दक्षिणेकडील चंद्रपूर जिल्ह्यात, जंगलविस्तार आणि खडकाळ भूभागाच्या सीमेवर वसलेलं आहे. या गावात सापडलेले 'पेट्रोग्लिफ्स' हे एका छोट्याशा खडकाळ उंचवट्यावर उघड्यावर आहेत. या परिसरात सध्या कोणतीही नदी किंवा पुरातन जलस्रोत नाही. परंतु प्राचीन काळात याठिकाणी मानवी वस्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दगडावर असं बनवलं खडकचित्र : याठिकाणी अंदाजे ६० ते ७० दगडांवर कोरीव आकृत्या स्पष्ट दिसून येतात. मुख्यतः या आकृत्या सरळ, आडव्या आणि तिरक्या रेषांनी बनलेल्या आहेत. काही ठिकाणी क्रॉस, चौकोन किंवा जाळीप्रमाणं रचना दिसून येते. कोरण्याची शैली पाहता, दगडावर टोकदार वस्तूनं ठोकून किंवा घासून या आकृती बनवल्या असाव्यात.
स्थानिकांकडून होते पूजा : वढोली गावाजवळ आढळलेल्या खडकावरील कोरीव कामांमध्ये कोणतेही स्पष्ट मानव, प्राणी किंवा देवतेसदृश चित्र दिसून येत नाहीत. परंतु रेषात्मक जाळ्यांमुळं हे संकेतचिन्ह, दिशा सूचक नकाशा किंवा एखादे धार्मिक प्रतीक असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्थानिकांनी एका मोठ्या दगडाला शेंदूर लावून देवस्थान म्हणून पूजाअर्चा सुरू केली आहे. ही बाब खडककलेच्या आणि लोकपरंपरेच्या संगमाचे उदाहरण आहे.
माहिती सांगताना इतिहास अभ्यासक अरुण झगडकर (ETV Bharat Reporter)
खडककला ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असण्याची शक्यता : विदर्भात विशेषतः गोंड आणि कोरकू आदिवासी जमातींची परंपरा आहे. त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या सांस्कृतिक सवयींमध्ये निसर्ग, खडक, वृक्ष यांची उपासना महत्त्वाची आहे. त्यामुळं या कोरीव खडककलेचा संबंध पूर्व-इतिहासातील आदिवासी प्रतीकात्मक संवाद प्रणालीशी असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या खडककलेची तुलना रत्नागिरी (कोंकण) मधील पेट्रोग्लिफ्स किंवा मध्य भारतातील भीमबेटका येथील भित्तिचित्रांशी करता येते. काही विद्वानांच्या मते, ही खडककला सुमारे ४,००० ते १०,००० वर्षे जुनी असू शकते, विशेषतः जर ते नवपाषाण किंवा मध्यपाषाण काळातले असतील.
कोकणातील कातळ-खोद-चित्रे
राजापुरची गूढ कातळ-शिल्पे
कोकणात रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कातळशिल्पांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंग्रजीमध्ये त्याला पेट्रोग्लिफ असा शब्द आहे. पेट्रोग्लिफ हा शब्द मूळ ग्रीक शब्दावरून आलेला आहे. ग्रीक भाषेत ‘पेट्रो’ म्हणजे खडक आणि ‘ग्लिफ’ म्हणजे कोरीव काम. खडकावर केलेले कोरीव काम म्हणून ‘पेट्रोग्लिफ’.कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतली जाते आणि त्यामध्ये कातळशिल्पे कोरली जातात. त्यांना उठाव कमी असतो. पावसाळा संपल्यावर गेले तर शिल्पे खास उठून दिसतात. कारण त्याच्या बाजूला गवत उगवलेले असते. कातळशिल्पांमध्ये मासा, कासव, बेडूक असे विविध प्राणी व पक्षी यांच्या आकृती दिसतात. काही भौमितिक रचना दिसतात. एकीकडून पाहिल्यास जहाज, तर दुसऱ्या बाजूने पाहिल्यानंतर दोन वाघांच्या मध्ये असलेला माणूस अशी द्विमितीय चित्रेही तेथे दिसली. वीजवाहक मनोरे आणि त्यांच्या तारा जशा दिसतील तशी काही रचना तेथे भासते. कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर आढळणाऱ्या कातळ शिल्पांचे गूढ कायम असतानाच याच भागातील राजापूरच्या कातळावरही आता तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत . मासे , जलकुंभ , जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या कातळांवर कोरलेल्या आहेत .
कणकवलीजवळ हिवाळ्याचा सडा, निवळी फाट्याजवळ गावडेवाडी, तसेच ऐन निवळी फाटा, भू, भालावल, देवीहसोळ, वेळणेश्वर या ठिकाणी कातळशिल्पे खोदलेली दिसतात. परंतु कोकणात अनेक ठिकाणी त्यांचा आढळ आहे. कातळशिल्पांचे प्रयोजन काय होते? ती कोणी आणि का खोदली? हे अजून न उलगडलेले कोडे आहे. कातळशिल्पांच्या जवळ अंदाजे दोनशे मीटर इतक्या त्रिज्येमध्ये खोल दगडी विहीर आढळते. हा नियम नव्हे, परंतु तशी ती बऱ्याच ठिकाणी आढळते. ही शिल्पे खोदणाऱ्या लोकांसाठी ती सोय केली असावी.
आदिमानवाने विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. ती कसली चित्रे आहेत, त्यातून काय प्रतीत होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे हे गूढ तर आहेच; शिवाय, ते एक मोठे नवलसुद्धा आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर तशा प्रकारचे कोरीव काम केलेले सर्वत्र आढळते. परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे खास करून कोकणातच पाहण्यास मिळतात. ह्या खोदचित्रांचे स्वरूप, त्यांचा आढळ, आणि त्यांच्यासंबंधी स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या विविध दंतकथा...
रत्नागिरीचे उत्साही संशोधक सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी चिकाटीने त्या खोदचित्रांचा अभ्यास केला आहे. त्यांची एक सूची तयार केली आहे. त्यांच्यामध्ये आढळणारे साम्य आणि विविधता यांचीसुद्धा बारकाईने नोंद केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्या विषयात लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि स्थानिक लोकांनासुद्धा त्या शोधकार्यात सामावून घेतले. रत्नागिरी जिल्ह्यामधील रत्नागिरी, राजापूर आणि लांजा या तीन तालुक्यांत जवळजवळ दोनशेऐंशीपेक्षा जास्त खोदचित्रे सापडली आहेत. त्यांच्या सोबतच काही देवता, जसे की गोपद्म आणि लज्जागौरी यांचे केलेले अंकन हे आश्चर्यचकित करते.
प्राण्यांचे आकार हे जिवंत प्राण्याच्या आकाराएवढे खोदलेले दिसतात. काही ठिकाणी हत्ती आणि वाघ यांचे केलेले अंकन अचंबित करते. त्याचा अर्थ ज्या काळात ही चित्रे खोदली गेली त्याकाळात त्या परिसरात हत्ती आणि वाघ हे असणार! मगर, कासव आणि मासे यांची चित्रेसुद्धा आढळतात. स्थानिक लोकांच्या समजुतीनुसार ती खोदचित्रे पांडवांनी वनवासात असताना खोदलेली आहेत. किंवा ती चित्रे तत्कालीन शेतकरी व मेंढपाळ यांनी त्यांच्या पशुधनाच्या रक्षणासाठी खोदली असावीत.
सर्व खोदचित्रांमध्ये मानवी चित्रांचे अंकन हे तुलनेने जास्त आहे. काही ठिकाणी माणसाचा आकार असून हात हे शरीराला चिकटलेले आहेत. डोके मात्र काहीसे उंच आणि निमुळते दिसते. तो कोणी परग्रहावरील मानव असावा असा सहज भास व्हावा इतके ते चित्र हुबेहूब खोदलेले आहे. काही ठिकाणी योगक्रियेमध्ये असलेल्या षट्चक्रांचे सांकेतिक अंकन केले असावे असे वाटते. तेथे मानवाचा देह फक्त डोक्यापासून कंबरेपर्यंत दाखवला आहे आणि त्यात सहा चक्रे खोदलेली दिसतात. अर्थात तो सगळा समजुतीचा भाग आहे व ते चित्र पाहून केलेला तो केवळ अंदाज आहे.
पुण्यातील भूगोल अभ्यासक डॉ . श्रीकांत कार्लेकर यांची टीम सध्या यावर अभ्यास करते आहे . कोकणातील भूजलस्रोतांबाबत संशोधन करताना कार्लेकर यांना राजापूरच्या उपळे गावात ही कातळ शिल्पे आढळली . कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्प हे आजही एक मोठे गूढ आहे . विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत . अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली आहेत . ही चित्रे , नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही . काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इसवी सन पूर्व ६००० वर्षे जुनी असावीत , .
कोकणातील जांभा दगडाचा , विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की , इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत . देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे मानण्यात येते . मात्र , रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे . येथील कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून , भूजल साठेही खूप खोल आहेत . राजापूरच्या कातळावर जुवाठी - उपळे - प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत . मासे , जलकुंभ , पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या आहेत . मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात , असे स्थानिक नागरिक सांगतात . शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे ,
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेल्या बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेलीकोरीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत . ही चित्रे प्रत्यक्ष पाहतानाती कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते . मात्र ती चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही . रत्नागिरीनजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभादगडावर कोरलेले नौकेचे चित्र पहावयाला मिळते .
गावडेवाडी आणि निवळीफाटा येथे भौमितिक रचना खोदलेल्या दिसतात. तशा रचनांना चारही बाजूंनी आधी चौकट खोदलेली आहे. त्या चौकटींच्या आतमधे विविध भौमितिक आकार आहेत. त्यांचे प्रयोजन अनाकलनीय आहे. विद्युत मंडळाच्या तारा जशा गावोगावी आढळतात तशा प्रकारचे नक्षीकाम त्या ठिकाणी केलेले दिसते. चौकोन, त्रिकोण, उभ्या आणि आडव्या समांतर रेषा, सापाची नक्षी अशा प्रकारचे विविध आकार त्या एकाच चौकटीत खोदलेले आढळतात.
सर्व कातळशिल्पांमध्ये अत्यंत देखणे शिल्प हे राजापूरजवळ बारसू गावी असलेल्या तारव्याचा सडा येथे पाहण्यास मिळते. राजापूरपासून देवाचे गोठणेला जाऊ लागले, की दहा किलोमीटरवर बारसू/बारसव गाव लागते. तेथून डावीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने अंदाजे दीड किलोमीटर गेले, की अंदाजे पन्नास फूट लांब आणि वीस फूट रुंद अशी काळ्या खडकावर खोदचित्र चौकट दिसते. तेथे खडकात दोन वाघ एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यांच्या मध्येच एक मानवी आकृती त्या दोन वाघांना थोपवून धरत आहे असे चित्र खोदलेले आहे. पण खरे आश्चर्य पुढेच आहे. तेच चित्र जर विरुद्ध बाजूने समोर जाऊन पाहिले तर एक मोठे गलबत समुद्रातून चाललेले दिसते. त्याला शिडे आहेत आणि खाली पाण्याच्या लाटा हलत आहेत, पाण्यात विविध मासे पोहत आहेत असे सर्व दाखवले आहे. दोन वाघांच्या मध्ये जी मानवी आकृती कोरलेली दिसते तिच्या छातीवर लज्जागौरीचे चिन्ह अगदी ठसठशीतपणे जाणवते. ते धार्मिक विधीचे शिल्पांकन असेल का? किंवा ते ठिकाण कोठल्या देवतेचे स्थान असेल का? सगळा तर्काचा भाग, परंतु इतके सुंदर, इतके अद्भुत आणि आखीवरेखीव चित्र पाहून प्रेक्षक थक्क होतो. तसेच एक चित्र गणपतीपुळ्याला जाणाऱ्या निवळी फाट्यावर होते. परंतु रस्तारुंदीकरणात ते निम्म्याहून अधिक संपले आहे! तो अगदी दुर्मीळ असा ठेवा आहे.
मराठे यांनी स्थानिक आमदारांच् या मार्फत विधिमंडळात सुद्धा तो प्रश्न उपस्थित केलेला आहे. राज्य सरकारकडून अशा कातळशिल्पांसाठी काही निधी राखून ठेवला गेला आहे. ते दोघे खेड्यापाड्यांत जाऊन शाळांमध्ये मुलांना व्याख्यान देतात आणि त्यांच्या त्यांच्या परिसरात तसा काही ठेवा असल्यास तो शोधण्यास सांगतात. आश्चर्य म्हणजे गुहागर तालुक्यातील शाळेच्या पटांगणातच तसे कातळशिल्प आढळून आले!
राजापूर-आडिवरे रस्त्यावर सोलगाव फाटा आहे. तेथून आत दहा किलोमीटरवर देवाचे गोठणे नावाचे गाव आहे. त्या गावी भार्गवरामाचे सुरेख मंदिर आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी ते गाव ब्रह्मेंद्रस्वामींना आंदण दिले होते. त्या गावात असलेल्या भार्गवराम मंदिरात एक सुंदर पोर्तुगीज घंटा टांगलेली आहे. मंदिराच्या समोर एक पायवाट डोंगरावर जाते. डोंगरावर गेले, की काही अंतर उजवीकडे चालून गेल्यावर एक आश्चर्य सामोरे येते. तेही कातळशिल्पच आहे. तेथे एक मानवी आकृती कोरलेली आहे. पण आश्चर्य असे, की त्या मानवी आकृतीच्या पोटावर जर होकायंत्र ठेवले तर ते चुकीची दिशा दाखवते! त्या आकृतीमध्ये काही चुंबकीय क्षेत्र तयार होते आणि होकायंत्र चुकीची दिशा दाखवते. तो चौकोन अंदाजे वीस चौरस फूट लांबीरुंदीचा आहे. तेथे कोठेही होकायंत्र नेले तरीसुद्धा दिशा चुकीची दिसते. कातळशिल्प खोदताना त्या मंडळींना याची माहिती होती हे तर नक्कीच. मग त्याच ठिकाणी असे का खोदले गेले असेल? वर्तमानकाळात प्रसिद्ध असलेली चुंबकीय चिकित्सा त्याकाळी ज्ञात होती का ? त्यासाठीच झोपलेल्या मानवाची ही आकृती आणि तेथे होकायंत्राची गडबड यांचा काही संबंध असेल का? मुळात त्या काळी होकायंत्रे होती का? हे सगळे प्रश्न येथे प्रेक्षकाला भंडावून सोडतात. परंतु त्या खोदचित्रामागे काहीना काही संकेत नक्की आहेत. त्या कातळशिल्पाच्या जवळ विहीर नाही, मात्र पाण्याचे छोटे कुंड आहे. संशोधकांना तेथे मोठे भुयार सापडले आहे. बाहेरून तरी ते खूप खोलवर गेलेले दिसते. त्याचा शोध घेण्याचे काम तेथे पावसाळ्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने हाती घेण्यात येणार आहे.
दुसरे एक सुंदर कातळशिल्प आहे देवीहसोळ या गावी. राजापूरच्या पुढे असलेल्या ‘भू’ या एकाक्षरी नाव असलेल्या गावापासून नऊ किलोमीटर अंतरावर देवीहसोळ हे गाव येते. तेथे आर्यादुर्गा देवीचे सुंदर मंदिर आहे. कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबांची ती कुलदेवता आहे. त्या मंदिराच्या अलिकडे व मंदिराला लागून रस्त्याच्या डाव्या हाताला अंदाजे पंधरा चौरस फुटांची चौकट आखलेली दिसते. त्या चौकटीला चारही बाजूंनी साखळ्या लावून संरक्षित केलेले आहे. चौकटीच्या आत सुरुवातीला सर्पाकार आकृती आहेत. चौकटीचे चार भाग केलेले दिसतात. त्या चार भागांमध्ये विविध आकृती कोरलेल्या आहेत. त्यांतील काही समजतात, काही अनाकलनीय आहेत. चौकटीच्या मध्यभागी गोल खोलगट खड्डा आहे. त्यात पाणी साठलेले असते. देवीहसोळच्या जवळ भालावली नावाचे गाव आहे. त्या गावात नवदुर्गेचे मंदिर आहे. देवीहसोळच्या आर्यादुर्गेचा उत्सव मार्गशीर्ष वद्य अष्टमीला असतो. त्यावेळी भालावलीहून नवदुर्गेची पालखी त्या देवीच्या भेटीला येते. त्या दोन गावच्या दोन देवींची भेट त्यावेळी कातळशिल्पावर होते, हे एक नवल म्हणायला हवे! त्या भेटीच्या वेळी कातळशिल्पाच्या मधोमध असलेल्या खोलगट भागात फुरसे नावाचा विषारी साप येतो आणि तो तेथेच दिवसभर बसून असतो असे स्थानिक सांगतात. त्या कातळशिल्पापासून देवीच्या मंदिरापर्यंत शंभर मीटर अंतर आहे. तेथे सर्वत्र विविध कातळशिल्पे खोदलेली दिसतात. त्यामध्ये हत्ती, मासा यांसारखे प्राणी प्रामुख्याने आढळतात. काही कातळशिल्पे कोरताना अर्धवट सोडलेली आहेत; मात्र बरीचशी सुस्पष्ट अशी खोदलेली आहेत.
त्या कातळशिल्पांपासून जेमतेम दोनशे मीटर अंतरावर कातळात खोदलेली मोठी विहीर बघण्यासारखी आहे. अंदाजे चाळीस फूट खोल विहिरीला उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या खोदलेल्या आहेत. कातळशिल्पाशेजारी विहीर हे सूत्र तेथे तरी पाहण्यास मिळते.
आशुतोष बापट ८६०५०१८०२०
सुधीर रिसबूड ९४२२३७२०२०
उक्षीतील कातळशिल्प
इंग्रजी भाषेत जी ‘रॉक आर्ट’ म्हणून ओळखली जाते तिला मराठीत ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. याचे शास्त्रीय नाव ‘पेट्रोग्लिफ्स’ असे आहे. ग्रीक भाषेतला हा शब्द असल्याने ग्रीक भाषेत पेटाचा अर्थ पाषाण आणि ग्लिफीन म्हणजे कोरणे असा आहे. निसर्गातल्या पाषाणावर मानवाने कोरलेल्या खुणा म्हणजे ‘पेट्रोग्लिफ्स’ होय. सर्वसाधारणपणे अशी शिल्प ही गुहेच्या भिंंतीवर किंवा उभ्या पाषणाच्या पृष्ठभागावर कोरली जातात.
परंतु, कोकणात ती आकाशाच्या छताखाली, कातळावर कोरली गेली आहेत. मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून या शिल्परचनेकडे पाहिले जाते. इसवी सन पूर्व ३५ हजार ते दहा हजार वर्षांपूर्वीचे शिल्प असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
२० फूट लांब व १६ फूट रूंदीचे हत्तीचे शिल्प कोरण्यात आले आहे. या शिल्पाच्या निकट तसेच शेजारच्या गावातही काही कोरीव कातळ शिल्प आढळली आहेत. प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना या शिल्पाव्दारे लोकांसमोर येत आहे. अनुप सुर्वे यांच्या जागेमध्ये हे हत्तीचे शिल्प आढळले. त्यांनी विनामोबदला ही जागा उपलब्ध करून दिली. तसेच जवळच काशिनाथ देसाई यांच्या जागेमध्ये सुमारे पंधरा खोदशिल्पे आहेत.
विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली ही कातळशिल्प नजरेस पडल्यानंतर त्याबाबतचे कुतूहल अधिक वाढले. रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात एक हजारपेक्षा अधिक कातळशिल्पे असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत. मंडणगड व गुहागर तालुक्यातही कातळशिल्पे सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत.
कोकणचा इतिहास उलगडणाऱ्या या खोदशिल्पांना राज्य संरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या लोकसहभागातून या कातळ खोदशिल्पाला संरक्षक कठडा बांधलेला आहे. त्याशेजारी चबुतरा बांधला असून, त्यावरून कातळशिल्प व्यवस्थित दिसू शकते.. त्यामुळे उक्षी गावात पर्यटनाचा नवा अध्याय सुरू होईल. उक्षीमध्ये पावसाळ्यात धबधबा पाहण्यासाठीही गर्दी होते. त्यासोबत कातळशिल्पे पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.
कसे जायचे?
हत्तीचे हे खोदशिल्प उक्षी गावातील प्रसिद्ध धबधब्यापासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गापासून २५ किलोमीटर, तर रत्नागिरी शहरातून ते ४० किलोमीटर अंतरावर आहे. कोकण रेल्वेचे स्थानकही उक्षी गावात असल्याने बाहेरील पर्यटकांनाही येथे जाणे शक्य आहे.
देवाचे गोठणे : श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी गुरू श्रीब्रह्मेंद्रस्वामी यांना हे गाव हे गाव इनाम म्हणून दिले होते. सन १७१०-११साली देवाचे गोठणे येथे स्वामी वास्तव्याला आले. त्यांनी या गावात असलेल्या श्री गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि याच मंदिरात परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अंदाजे दोन फूट उंचीची तांब्याची ही मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे मंदिराच्या मागे असलेल्या दगडी मार्गाने माथ्यावर गेले, की एक अप्रतिम कातळशिल्प आवर्जून पाहण्याजोगे आहे. इथल्या खडकामध्ये चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे होकायंत्र ठेवले असता ते चुकीची दिशा दाखवते.
कातळशिल्प म्हणजे काय ? - सिंहासन"
अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे उभ्या दगडांवर / भिंतींवर असतात. तर आडव्या भूपृष्ठावर असणाऱ्या चित्रांना / आकृत्यांना जिओगलिप्स असे म्हणतात. महाराष्ट्रात कोकणातील कातळशिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्यात याची निश्चिती नाही. आत्तापर्यंत रत्नागिरी तालुक्यात ४९० पेक्षा जास्त , राजापूरमध्ये २९० पेक्षा जास्त ; तर अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे उभ्या दगडांवर / भिंतींवर असतात. तर आडव्या भूपृष्ठावर असणाऱ्या चित्रांना / आकृत्यांना जिओगलिप्स असे म्हणतात. महाराष्ट्रात कोकणातील कातळशिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्यात याची निश्चिती नाही. आत्तापर्यंत रत्नागिरी तालुक्यात ४९० पेक्षा जास्त , राजापूरमध्ये २९० पेक्षा जास्त ;जास्त इतक्या संख्येने खोदचित्रे नोंदविण्यात आली आहेत.
कोकणातील या कातळ- खडकातील चित्रांमध्ये अनाकलनीय रचना, मानवाकृती, पक्षी, समुद्री जीव, नागमोडी सर्प, इत्यादी प्रकारचे आकृती दिसतात. त्या आकारानेही प्रचंड मोठ्या आहेत. कोकणात आढळणारी प्रत्येक ठिकाणची शिल्पे वेगवेगळी आहेत. यापूर्वी जगामध्ये इतर ठिकाणी आढळलेली शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या मऊ प्रकारच्या दगडात कोरलेली आहेत. पण, कोकणातील शिल्पे कोरलेला जांभा दगड त्यामानाने कठीण आहे. हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच प्रदीर्घ कालावधीत त्यावर ऊन-पाऊस, थंडी-वारा अशा वातावरणीय बदलांचा परिणाम होऊनही ती अस्तित्व टिकवून आहेत. कातळशिल्पातील मानवाकृतीला गावराखा किंवा पाच पांडव सुद्धा म्हणतात.
कशेळी : इथले शिल्प भारतातील सर्वात मोठे कातळशिल्प असावे. इथल्या हत्तीची आकृती १८ मीटर x १३ मीटर इतकी भव्य आहे. हत्तीच्या आकृतिबंधाच्या पोटात वाघ, माकड, शार्क, गेंडा, स्टिंग रे, पक्षी, मोर यांसारख्या ७०/८० प्राणी व पक्षी आकृत्या आहेत.
देवीहसोळ : येथील आर्यदुर्गा मंदिराजवळ कातळशिल्पे आहेत. शिल्पाचा आकार ८.५० मीटर x ८.५० मीटर आहे. इथले चित्र खरंच अनाकलनीय आहे. आयतामध्ये वेगवेगळ्या भौमितीय रचना असून त्यात कुठेही प्राणी अथवा पक्षी दिसून येत नाही. या चित्राचा चर ८ ते १० सेमी आहे.
उक्षी : हत्तीचे कातळशिल्प आहे. अतिशय देखण्या हत्तीचे सुळे, कान, शेपूट, सोंड व पाय हे सर्व अवयव सुबकपणे चितारलेले आहेत.
देवदू - येथील चित्रात एकशिंगी गेंडा, हरिणाच्या कुळातील प्राणी, काही अनाकलनीय प्राणी आणि भौमीतिक रचना आहेत. गेंड्यासारखे कान आणि शिंग उठून दिसते. प्राण्याचे आकार नाकड आणि कोल्ह्यासारखे दिसतात.
बारसू : इथे दोन वाघांच्यामध्ये माणूस उभा असल्याची रचना मानवाच्या खऱ्या आकारापेक्षा मोठ्या प्रमाणावर कोरलेली आहे माणसाच्या शेजारी मासा, ससा आणि मोरसुद्धा आहेत.
जांभरुण :- या ठिकाणी ५० आकृत्या कोरल्या आहेत. त्यापैकी ८ मानवाच्या तर इतर जलचर प्राणी आणि चार पायाच्या प्राण्याचे आकार आहेत.
esakal.com
Devihasol Katal Shilp : देवीहसोळचे कातळशिल्प राजापूरचे सौंदर्य; 300 हून अधिक नमुने, गाव पोचले जागतिक पटलावर
राजेंद्र बाईत
3–4 minutes
देवीहसोळ गावच्या सड्याच्या सुमारे तीन चौरस किमी परिसरात सुमारे पंधरा ठिकाणी आढळून आलेल्या तिनशेहून अधिक चित्र वैशिष्ट्यपूर्ण रचना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या आहेत.
राजापूर : रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेच्या पाठपुराव्याने संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र यांच्या विशेष प्रयत्नातून युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ प्रस्तावित यादीमध्ये नऊ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात देवीहसोळ येथील ठिकाणाचा समावेश आहे. आकाराने सर्वात मोठ्या आणि आश्चर्यकारक कातळ शिल्प (Katal Shilp Konkan) रचनांचा समावेश असलेले आणि एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी कातळशिल्प आढळणारे देवीहसोळ हे बहुधा एकमेव गाव आहे.
एकाच परिसरातील कातळशिल्प निर्मितीतील विविध पद्धतीचे हे उत्तम नमुने अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मानले जात आहेत. निसर्गसंपदेने नटलेल्या देवीहसोळ गावचा (Devihasol Rajapur) सडा परिसर, निसर्ग आणि मानवी अभिव्यक्तीचा अनोखा संगम याचा आढावा घेणारी मालिका आजपासून.
राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील आर्या दुर्गा मंदिरानजीक असलेले पटसदृश्य कातळशिल्प आणि परिसराचा समावेश जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीमध्ये केला आहे. ही तालुक्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. जागतिक पटलावर आलेल्या देवीहसोळ गावच्या सड्यावर तब्बल तीनशेहून अधिक विविध कातळशिल्प आहेत.
तालुक्यातील देवीहसोळ हे मुचकुंदी आणि बेनी या नद्यांच्या संगमावर वसलेले गाव. गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. या वैभवात भर घालणारी मुचकुंदी नदी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ऋतुमानानुसार विविध रूपे दाखविणारा विस्तीर्ण सडा अशी वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना या गावाला लाभलेली आहे. गावच्या सड्यावर ग्रामदेवता जाकादेवी आणि आर्यादुर्गा देवीचे मंदिर असून हे देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिरालगतच भलेमोठे पटसदृश कातळशिल्प असून सुमारे २४ फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद, अत्यंत ठसठशीत, उठावाचे चित्र असावे असा भास निर्माण करणारी आणि आपल्या तर्क शक्तीला आव्हान देणारी ही चित्र रचना अनोखी आहेत.
Katal Shilp Devihasol village
Katal Shilp Devihasol villageesakal
याच्याच बाजूला मगर, खेकडा, हॅमर हेड मासा, हत्ती, शिंग सदृश रचना आणि काही सांकेतिक रचना असा साधारण १५ चित्र रचनांचा समूह आढळून येतो. निसर्गयात्री संस्थेचे संशोधक सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि सहकाऱ्यांनी कातळशिल्पांच्या सुरुवातीच्या केलेल्या संशोधनामध्ये देवीहसोळ गावातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी कातळशिल्प प्रकाशात आली. संशोधनानंतर या टीमचे दहा वर्ष या परिसरातील कातळशिल्पांचे संशोधनाचे काम सुरू आहे.
देवीहसोळ गावच्या सड्याच्या सुमारे तीन चौरस किमी परिसरात सुमारे पंधरा ठिकाणी आढळून आलेल्या तिनशेहून अधिक चित्र वैशिष्ट्यपूर्ण रचना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या आहेत. या बाबी या भागात अश्मयुगीन मानवाचे दीर्घकाळ वास्तव्य होते हे निर्देश करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने या सर्वांचे समग्र दस्तऐवजीकरण, सखोल संशोधन प्रक्रिया चालू असल्याची माहिती निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड यांनी दिली.
mmcnewsnetwork.com
धामापूर सड्यावर आढळले शिकारीचे कातळशिल्प, गुहा आणि दगडी हत्यारे
mmcnews mmcnews
4–5 minutes
धामापूर सड्यावर आढळले शिकारीचे कातळशिल्प, गुहा आणि दगडी हत्यारे
सिंधुदुर्ग, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.
साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच ते अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. सिद्धेश आचरेकर, अनिकेत पाटील यांनी या युवकांसह त्या ठिकाणी जाऊन या कातळशिल्पांची स्वच्छता केली आणि त्याभोवती दगड रचून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले.
या माहितीच्या आधारे लळीत यांनी या परिसरात आणखी काही कातळशिल्पे असण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ. सई लळीत तसेच शुभेन्दू लळीत यांच्यासह शोधमोहीम राबवली. या मोहिमेत आणखी काही कातळशिल्पे आढळून आली. विशेष म्हणजे प्रथमच शिकारी माणसाचे कातळशिल्प आढळून आले आहे. एका मानवाकृतीच्या हातात कुऱ्हाडसदृश शस्त्र असून ती व्यक्ती कोणाचातरी पाठलाग करीत आहे, असे हे कातळशिल्प पाहिल्यावर लक्षात येते.
याच्या बाजूलाच एका रानडुकराचे कातळशिल्प खोदलेले आहे. याचबरोबर गोड्याची वाडी येथे याआधी सापडलेल्या कातळशिल्पापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर २४ बाय १८ फुट आकाराचे एक भव्य कातळ शिल्प दिसून येते. हे कातळशिल्प अत्यंत आकर्षक आणि भौमितिक रचनांचे आहे. अमूर्त शैलीतील ही एक मानवाकृती आहे, असे प्रथमदर्शनी वाटते. मात्र अन्य ठिकाणी आढळलेल्या मानवाकृती आणि या आकृतीमध्ये पुष्कळ फरक आहे, अशी माहिती लळीत यांनी दिली.
ज्या ठिकाणी शिकार करणारी व्यक्ती आणि रानडुकराचे कातळशिल्प सापडले, तेथील परिसरात शोध घेतला असता तिथून अगदी जवळच एक नैसर्गिक गुहा आढळून आली. साधारणपणे चार ते पाच व्यक्ती बसू शकतील, अशा आकाराची ही गुहा आहे. या गुहेच्या परिसरात 14 ठिकाणी ‘वॉटर होल्स’ म्हणजे कातळात असलेले पाणी साठवण्याचे खड्डे सापडले आहेत. हे खड्डे खोल असतात आणि त्यात पावसाचे पाणी साठून राहते. हे पाणी अगदी एप्रिल, मे महिन्यापर्यंत उपलब्ध असते, असे आढळून आले आहे.
कुडोपी येथील ‘बाहुल्यांचे टेंब’ येथील कातळशिल्पांच्या ठिकाणीही अशा प्रकारचे वॉटर होल्स आढळून आले आहेत. प्राचीन काळातील ही पाणी व्यवस्थापन प्रणाली आहे. तथापि कातळशिल्पे, गुहा आणि वॉटर होल्स एकाच ठिकाणी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यादृष्टीने धामापूर-मोगरणे सडा हे पुरातत्वीय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे लळीत यांचे म्हणणे आहे.
अमश्युगीन हत्यारेही सापडली
या गुहेच्या परिसरात शोध घेतला असता अश्मयुगीन दगडी हत्यारेही आढळून आली. ही हत्यारे स्क्रेपर्स म्हणजे ‘तासण्या’ या प्रकारची आहेत. मेलेल्या जनावराला कापण्यासाठी किंवा त्याच्या चामडीपासून चरबी अलग करण्यासाठी ह्या तासण्या वापरल्या जात असत, अशी माहिती त्यांनी दिली.
साळेल, मोगरणे आणि धामापूर या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या या विस्तीर्ण सड्यावर आणखीही कातळशिल्पे असण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार पाऊस आणि अलीकडेच एका वन्यश्वापदाने शेळीवर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यामुळे ही मोहीम पूर्ण दिवस राबवता आली नाही. पावसाळ्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जाणार असल्याचे लळीत यांनी सांगितले.
हिवाळे येथील जिल्ह्यातील पहिल्या कातळशिल्पांचा शोध 2001 मध्ये लावल्यापासून लळीत यांनी अनेक ठिकाणची कातळशिल्पे उजेडात आणली. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी खोटले (धनगरवाडी क्र.२) येथील ४० हून अधिक कातळशिल्पांचा शोध लावला. याचबरोबर चंद्रवदन कुडाळकर, प्रसाद करंदीकर, डॉ. कमलेश चव्हाण, गुरुनाथ राणे, गणेश मेस्त्री, संतोष वरक, रणजित हिर्लेकर, अजित टाककर, कमलेश गोसावी यांच्यासह अनेकांनी कुडोपी, वानिवडे, वाघोटण, कुणकेश्वर, दाभोळे पोखरबाव, बापर्डे, किर्लोस, हेदुळ, ओवळीये, खुडी, आरे यासह सुमारे वीस ठिकाणी कातळशिल्पांचा शोध आतापर्यंत लावला आहे.
जिल्ह्यातील अशा तीनशेहून अधिक कातळशिल्पांचा अभ्यास करुन लळीत यांनी त्याबाबतचे शोधनिबंध पुरातत्त्वीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. कुडोपी येथील ८० कातळशिल्पांचा समूह (क्लस्टर) असलेल्या ठिकाणाचा समावेश ‘युनेस्को’ने ‘जागतिक वारसा स्थळां’च्या प्राथमिक यादीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही सुरु आहे. मात्र, बहुतांश ठिकाणची कातळशिल्पे चिरेखाणींच्या विळख्यात सापडली असून अनेक ठिकाणी ती नष्टही झाली आहेत.
धामापूर, खोटले येथील कातळशिल्पांपासून चिरेखाणी तर काही फुटांवर आल्या आहेत. याकडे असेच दुर्लक्ष राहिले तर पुरातत्वीय वारसा आणि पर्यटन यादृष्टीने महत्वाचा असा हा प्राचीन मानवी वारसा नष्ट होण्याची भीती लळीत यांनी व्यक्त केली आहे.
samantfort.blogspot.com
Offbeat Kokan गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)
अमित सामंत ( AMIT S. SAMANT)
4–5 minutes
"कुंभडक"
मालवणच्या घरी गेलो की, मी घरी स्वस्थ बसत नाही. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाण्यासारखी इतकी ठिकाण आहेत की, मला कधीच निराश व्हाव लागल नाही. काही दिवसापूर्वी लोकसत्ता मध्ये बातमी आली होती, "मालवणजवळ आदिमानव कालिन कातळशिल्प मिळाली". यापूर्वी मी मध्यप्रदेशातील भिमबेटकाच्या आदिमानवाच्या गुहा व चित्र पाहिली होती, त्यामुळे आमच्या कोकणातल्या आदिमानवांनी काढलेली कातळशिल्प पहाण्यासाठी मी उत्सुक होतो.
मालवण पासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोड आडबाजूला आहे. डोंगराततून वहात येणार पाणी पाटाने गावात खेळवल आहे. त्यावरच गावाची शेती -बागायती व धुण - भांड्यांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळशिल्पांबद्दल चौकशी केली, पण अस काहीही आपल्या गावात नाही आहे अस गावकर्यांनी सांगितल. तितक्यात मला आठवल की, आमच्या गावात दगडात कोरलेली प्रचंड विहिर आहे. ही विहिर पांडवांची विहिर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच सामान्य लोकांनी पिढ्यान पिढ्या खपून काही अचाट, प्रचंड काम केलेलं असल तर त्याला पांडवांच नाव दिले्ले आढळते.) त्यामुळे या कातळशिल्पांनाही पांडवांचा काही संदर्भ असेल, म्हणून पांडवाच्या शिल्पांबद्दल विचारल्यावर गावकर्यांनी होकार दिला, ते म्हणाले "पांडवाची चित्र " सड्यावर आहेत. गावातल्या तरूण पिढीला या पांडवांच्या चित्राबद्दल फारशी माहिती नव्हती. (हि खरतर आपली शोकांतीका आहे. आजवर अनेक ठिकाणी फिरतांना मला असा अनुभव आलेला आहे, आपल्या गावात पहाण्या लायक एखादी ऎतिहासिक गोष्ट आहे, हेच बर्याच जणांना माहित नसते.)
गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत एका झाडावर शेणाने बनवलेल मधमाश्यांच ३ फूट उंचीच उलट्या नरसाळ्याच्या (फनेलच्या) आकाराच पोळ बघायला मिळाल. स्थानिक लोक या पोळयाला "कुंभडक" म्हणतात. शेणाने बनवलेल्या या पोळ्याच्या बाहेरच्या बाजूला हाताने जमिन सारवल्यावर जशी नक्षी येते तशीच नक्षी मधमाशांनी पायांनी तयार केलेली दिसली. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला सडा व त्यावरच पिवळ पडलेल गवत नजरेत मावत नव्हत. पंधरा मिनिट सड्यावर चालल्यावर अचानक आदिमानवाने कातळात कोरलेली चित्र दिसायला लागली. त्यांचे आकार व गुढरम्यता पाहून आम्ही थक्क झालो. मी आणि कौस्तुभ त्या शिल्पांवरच गवत उपटून त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. माणूस, झाडे, पशू, पक्षी, मासे इत्यादी आकार आम्ही ओळखू शकलो. यातील एका मानवाकृतीची लांबी ३.५ मीटर भरली तर, एका वर्तूळाकृती चित्राचा परिघ ३ मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गुढरम्य होते. त्यांचे आकार पाहून मला शामलन नाईटच्या "साईन्स (Signs)" या हॉलिवूडपटाची आठवण झाली. त्यात परग्रहवासी शेतांमध्ये मोठ मोठी वर्तूळं, चिन्ह काढून ठेवतात. पण ही चित्र मात्र आदिमानवानेच काढलेली होती. त्यात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी माणस, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता. अशा चित्रप्रकाराला शास्त्रीय भाषेत "रॉक आर्ट" म्हणतात. कुडोपीच्या या कातळचित्रांचाही श्री.सतीश लळित यांनी अभ्यास करून त्यावर पेपरही प्रसिध्द केलेला आहे. एकूण ६० चित्र त्या माळावर विखुरलेली आहेत. ती शोधून त्यांचा अर्थ लावता लावता तीन तास कधी निघून गेले कळलच नाही. परतांना मनात सारखा विचार येत होता , कोकणातला धुवाधार पाऊस, सड्यावरचा ठिसूळ दगड, वारा, गवत यांच्याशी झुंज देत ही चित्र हजारो वर्ष तशीच पडली आहेत आज त्यातील बरीच चित्र नष्ट झाली आहेत, पुसट झाली आहेत. आता जर या चित्रांचे योग्य संरक्षण केल नाही तर उरलेला आपला हा राष्ट्रीय ठेवा सुध्दा नष्ट होईल.
मानवाकृती
त्रिशूळ
जाण्यासाठी :- मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून २२ किमीवर आचरा गाव आहे. आचर्याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचर्यापासून २.५ किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फूटतो. या फाट्याने ६ किमी गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी टेंब वाडीत जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाड्या घेऊन कातळशिल्प पहायला जावे.
मासे
मानवाकृती
कातळशिल्पाच्या परीघावर ३ जण उभे आहेत.
३.५ मीटर लाबं मानवी शिल्पाचा पाय
kokansadlive.com
सिंधुदुर्गात प्रथमच सापडले शिकारीचे कातळशिल्प | गुहा आणि दगडी हत्यारे
4–5 minutes
सिंधुदुर्गनगरी : धामापूर, साळेल आणि मोगरणे गावच्या सीमेवरील सड्यावर आणखी कातळशिल्पांचा शोध लागला आहे. या ठिकाणी प्रथमच शिकारी आणि रानडुक्कर यांचे कातळशिल्प, तसेच अश्मयुगीन गुहा आणि काही दगडी हत्यारे सापडली आहेत, अशी माहिती कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी दिली.
साळेल येथील युवक परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे यांना काही दिवसांपूर्वीच ते अळंबी शोधण्यासाठी गेले असता धामापूरच्या सड्यावर गोड्याची वाडी हद्दीत दोन कातळशिल्पे आढळून आली होती. सिद्धेश आचरेकर, अनिकेत पाटील यांनी या युवकांसह त्या ठिकाणी जाऊन या कातळशिल्पांची स्वच्छता केली व त्याभोवती दगड रचून ठेवण्याचे कौतुकास्पद काम केले.
या माहितीच्या आधारे श्री. लळीत यांनी या परिसरात आणखी काही कातळशिल्पे असण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉ. सई लळीत व शुभेन्दू लळीत यांच्यासह शोधमोहीम राबवली. या मोहिमेत आणखी काही कातळशिल्पे आढळून आली. विशेष म्हणजे प्रथमच शिकारी माणसाचे कातळशिल्प आढळून आले आहे. एका मानवाकृतीच्या हातात कुऱ्हाडसदृश शस्त्र असून ती व्यक्ती कोणाचातरी पाठलाग करीत आहे, असे हे कातळशिल्प पाहिल्यावर लक्षात येते. याच्या बाजूलाच एका रानडुकराचे कातळशिल्प खोदलेले आहे. याचबरोबर गोड्याची वाडी येथे याआधी सापडलेल्या कातळशिल्पापासून सुमारे पाऊण किलोमीटर अंतरावर २४ बाय १८ फुट आकाराचे एक भव्य कातळ शिल्प दिसून येते. हे कातळशिल्प अत्यंत आकर्षक आणि भौमितिक रचनांचे आहे. अमूर्त शैलीतील ही एक मानवाकृती आहे, असे प्रथमदर्शनी वाटते. मात्र अन्य ठिकाणी आढळलेल्या मानवाकृती आणि या आकृतीमध्ये पुष्कळ फरक आहे, अशी माहिती श्री. लळीत यांनी दिली.
ज्या ठिकाणी शिकार करणारी व्यक्ती आणि रानडुकराचे कातळशिल्प सापडले, तेथील परिसरात शोध घेतला असता तिथून अगदी जवळच एक नैसर्गिक गुहा आढळून आली. साधारणपणे चार ते पाच व्यक्ती बसू शकतील, अशा आकाराची ही गुहा आहे. या गुहेच्या परिसरात 14 ठिकाणी 'वॉटर होल्स' म्हणजे कातळात असलेले पाणी साठवण्याचे खड्डे सापडले आहेत. हे खड्डे खोल असतात व त्यात पावसाचे पाणी साठून राहते. हे पाणी अगदी एप्रिल, मे महिन्यापर्यंत उपलब्ध असते, असे आढळून आले आहे. कुडोपी येथील 'बाहुल्यांचे टेंब' येथील कातळशिल्पांच्या ठिकाणीही अशा प्रकारचे वॉटर होल्स आढळून आले आहेत. प्राचीन काळातील ही पाणी व्यवस्थापन प्रणाली आहे. तथापि कातळशिल्पे, गुहा आणि वॉटर होल्स एकाच ठिकाणी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यादृष्टीने धामापूर-मोगरणे सडा हे पुरातत्वीय महत्त्वाचे ठिकाण आहे, असे श्री. लळीत यांचे म्हणणे आहे.
या गुहेच्या परिसरात शोध घेतला असता अश्मयुगीन दगडी हत्यारेही आढळून आली. ही हत्यारे स्क्रेपर्स म्हणजे 'तासण्या' या प्रकारची आहेत. मेलेल्या जनावराला कापण्यासाठी किंवा त्याच्या चामडीपासून चरबी अलग करण्यासाठी ह्या तासण्या वापरल्या जात असत, अशी माहिती त्यांनी दिली.
साळेल, मोगरणे आणि धामापूर या तीन गावांच्या सीमेवर असलेल्या या विस्तीर्ण सड्यावर आणखीही कातळशिल्पे असण्याची शक्यता आहे. मात्र मुसळधार पाऊस आणि अलीकडेच एका वन्यश्वापदाने शेळीवर केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यामुळे ही मोहीम पूर्ण दिवस राबवता आली नाही. पावसाळ्यानंतर या परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जाणार असल्याचे श्री.लळीत यांनी सांगितले.
हिवाळे येथील जिल्ह्यातील पहिल्या कातळशिल्पांचा शोध 2001 मध्ये लावल्यापासून श्री. लळीत यांनी अनेक ठिकाणची कातळशिल्पे उजेडात आणली. गेल्या वर्षी जूनमध्ये त्यांनी खोटले (धनगरवाडी क्र.२) येथील ४० हून अधिक कातळशिल्पांचा शोध लावला. याचबरोबर चंद्रवदन कुडाळकर, प्रसाद करंदीकर, डॉ. कमलेश चव्हाण, गुरुनाथ राणे, गणेश मेस्त्री, संतोष वरक, रणजित हिर्लेकर, अजित टाककर, कमलेश गोसावी यांच्यासह अनेकांनी कुडोपी, वानिवडे, वाघोटण, कुणकेश्वर, दाभोळे पोखरबाव, बापर्डे, किर्लोस, हेदुळ, ओवळीये, खुडी, आरे यासह सुमारे वीस ठिकाणी कातळशिल्पांचा शोध आतापर्यंत लावला आहे.
जिल्ह्यातील अशा तीनशेहून अधिक कातळशिल्पांचा अभ्यास करुन श्री. लळीत यांनी त्याबाबतचे शोधनिबंध पुरातत्त्वीय परिषदांमध्ये सादर केले आहेत. 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. कुडोपी येथील ८० कातळशिल्पांचा समूह (क्लस्टर) असलेल्या ठिकाणाचा समावेश 'युनेस्को'ने 'जागतिक वारसा स्थळां'च्या प्राथमिक यादीत केला आहे. त्याची पुढील कार्यवाही सुरु आहे. मात्र, बहुतांश ठिकाणची कातळशिल्पे चिरेखाणींच्या विळख्यात सापडली असून अनेक ठिकाणी ती नष्टही झाली आहेत. धामापूर, खोटले येथील कातळशिल्पांपासुन चिरेखाणी तर काही फुटांवर आल्या आहेत. याकडे असेच दुर्लक्ष राहिले तर पुरातत्वीय वारसा आणि पर्यटन यादृष्टीने महत्वाचा असा हा प्राचीन मानवी वारसा नष्ट होण्याची भीती श्री. लळीत यांनी व्यक्त केली आहे.
kokanmedia.in
पूर्वजांच्या पाषाणखुणांच्या शोधाची गोष्ट : कोकणातील कातळ-खोद-चित्रे - साप्ताहिक कोकण मीडिया
Kokan Media
43–55 minutes
गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल अनेकांना कुतुहल आहे. हे शोधकार्य ज्या स्थानिक अभ्यासकांनी कुतुहलाने केले आणि हा ठेवा जगासमोर आणला, ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनीच मांडलेला हा शोधकार्याचा गूढरम्य प्रवास…
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकातील लेख)
………………
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू गावाच्या सड्यावर धनगर समाजातील सुमारे ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीबरोबर गप्पा सुरू असताना सड्याच्या दुसऱ्या टोकाला निर्देश करून ‘असे काहीतरी आहे’ असे त्या व्यक्तीने सांगितले आणि जवळपास दीड-दोन वर्षे अंधारात चालू असलेल्या आमच्या कातळ-खोद-चित्र शोधाच्या प्रवासाला आणि मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा एक मोठा खजिना समोर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.
अशा प्रकारच्या चित्ररचनांकडे मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून पाहिले जाते. मानवी जीवनाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जगाच्या सर्वच भागांत पेट्रोग्लिफ्सची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्यतः ही कला गुहेच्या भिंतींवर, उभ्या पाषाणाच्या बाजूंवर कोरलेली आहेत. परंतु कोकणात आढळणाऱ्या या कलेचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे इथे आढळणाऱ्या चित्ररचना तत्कालीन मानवाने उघड्या आकाशाच्या छताखाली कातळ सड्याच्या पृष्ठभागावर आडव्या स्वरूपात कोरल्या आहेत.
कोकणातील किनाऱ्याजवळच्या जांभ्या खडकांच्या खुज्या/कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात. जांभ्या खडकाच्या सच्छिद्रतेमुळे या पठारांची पाणी धारण करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या सड्यांवर खुरट्या वनस्पती, पावसाळ्यानंतर उगवणारे गवत या व्यतिरिक्त वृक्षराई फारच अभावाने आढळते. या कारणांनी या पठारांवर आजही फारशी मनुष्यवस्ती आढळत नाही. अशा या सड्यांवर अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणा म्हणजे कातळ-खोद-चित्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कातळ सड्यांवर कोरून निर्माण केलेल्या द्विमितीय चित्रांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लिफ्स असे म्हणतात. प्रस्तुत लेख आहे तो या कातळ-खोद-चित्रांच्या शोध प्रवासाचा आणि त्यात आलेल्या अनुभवांचा.
या कातळ-खोद-चित्रांचा शोध हा खरे तर आमच्या ‘आडवळणावरचे कोकण’ या संकल्पनेतील एक भाग. कोकणभूमीची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी केली, असे उल्लेख प्राचीन साहित्यातून आपल्यासमोर येतात. भगवान परशुरामांच्या आईचे- रेणुकेचे नाव कुंकणा असे होते. त्यावरून या भूभागाला कोकण असे नाव पडले, असे उल्लेख पुराणातून येतात. अपरान्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाला इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकापासून कोकण या नावाने ओळखले जाते. अपर या शब्दाचा अर्थ पश्चिम असाही आहे. पश्चिमेच्या शेवटच्या टोकाचा (अन्त) प्रदेश म्हणजे अपरान्त. आजपर्यंत आपण कोकणाचा हा इतिहास शिकत, ऐकत आलो आहोत. परंतु अलीकडे आढळून येत असलेल्या कातळ-खोद-चित्रांमुळे कदाचित कोकणाचा इतिहास नव्याने लिहावा लागेल.
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे म्हणजेच कोकण म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री आणि अथांग महासागर यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण. डहाणू ते महाड या भागाला उत्तर कोकण, तर कशेडी घाटापासून सिंधुदुर्गातील तेरेखोलच्या खाडीपर्यंतच्या भागाला दक्षिण कोकण म्हणून ओळखले जाते. हवामानदृष्ट्या हा प्रदेश सारखाच असला, तरी उत्तर कोकण व दक्षिण कोकण हे प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले प्रदेश आहेत. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड हा प्रामुख्याने दक्षिण कोकणात आढळून येतो. दक्षिण कोकणाचा हा जांभ्या दगडाचा भूप्रदेश आपल्या अंगा-खांद्यावर, पोटात अनेक रहस्ये घेऊन बसला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश वैविध्यपूर्ण बाबी, जैवविविधता आणि संस्कृतीच्या विविध अंगांनी ओतप्रोत भरलेला आहे. खरे सांगायचे झाले, तर उभ्या महाराष्ट्रात कोकणासारखा प्रदेश नाही. परंतु ठराविक ठिकाणे, गोष्टी या पलीकडचा कोकण प्रदेश आम्हा कोकणातील लोकांनाच माहिती नाही. निसर्गप्रेमातून आमची भटकंती सुरू झाली आणि या बाबी आमच्या समोर येऊ लागल्या. त्यातूनच जन्माला आली, ती ‘आडवळणावरचे कोकण’ ही संकल्पना.
निवळी येथील कातळ-खोद-चित्रे. (लेखात सर्वांत आधी दिलेला फोटो उक्षीच्या कातळ-खोद-चित्राचा.)
कातळ-खोद-चित्रांच्या शोधप्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी या विषयातील कोणतेही ज्ञान आम्हाला नव्हते. डोळ्यासमोर होत्या त्या निवळी, देवीहसोळ येथील एक-दोन चित्ररचना. काहीतरी पुरातन आहे, एवढाच काय तो आमचा या चित्रांशी संबंध. प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या भेटीत या चित्रांचे महत्त्व समजले. आणि ती चित्रे मनावर कोठे तरी कोरली गेली होती.
बारसूच्या सड्यावर भेटलेल्या व्यक्तीने आमच्या चौकशीतील निसटत असलेली कडी गुंफून दिली. त्या भल्याथोरल्या सड्यावर निव्वळ अंगुलीनिर्देशानुसार मिळालेल्या माहितीवरून संबंधित ठिकाण शोधणे म्हणजे एक आव्हानच होते. तुटपुंज्या माहितीच्या जोरावर, दिशादर्शनातून मिळालेल्या ठिकाणी पोहोचलो. हे ठिकाण म्हणजे राजापूर तालुक्यातील गोवळ गावाचा सडा. गावातून सड्यावर येण्यासाठी असलेली पाखाडी. पाखाडी चढताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत सड्यावर पाऊल टाकले. नकळतच ‘अरे बापरे’ हे शब्द बाहेर पडले. एवढ्या मोठ्या सड्यावर शोधणार कसे? मिळालेल्या भौगोलिक माहितीच्या आधारे नजरेसमोर एक भासमान क्षेत्र उभे केले. अर्थात त्यासाठी आपल्याला बोलीभाषेतील शब्द, खुणा यांची थोडीफार तरी जाण असावी लागते. ‘हे फडे तिकडे सातवीण त्या अंगाला खरी’ करत प्रत्येक पावलागणिक पायाखाली पाहत मार्गक्रमणा सुरू झाली. थोड्या वेळात ‘इथे काही तरी आहे’ असे शब्दोच्चार झाले. अगदी पुसटपणे दिसत असलेल्या चित्रांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन साफसफाई सुरू केली. काम करता करता ‘अरे इथे पण आहे, तिकडे पण,’ असे करत करत तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह समोर आला. या चित्ररचनांमध्ये प्राणी, पक्षी, अनाकलनीय अशा भौमितिक रचना यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शोधाच्या पहिल्याच पावलावर मिळालेले हे यश आम्हाला आनंद देऊन गेले. हे काम करत असताना त्या वेळचे वातावरण मात्र असह्य करणारे होते. वातावरणातील हा फरक आम्हाला लक्षात येत नव्हता. शक्य तेवढ्या लवकर काम आटोपून तिथून परत फिरण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुक्कामी परतेपर्यंत एका मोठ्या वादळी पावसाने आम्हाला गाठले आणि वातावरणात झालेल्या फेरबदलाचे कारणदेखील समजले. एका वेगळ्या विषयातील आमचा प्रवेश, सोबत निसर्गातील वेगवेगळे अनुभव यांची व्याप्ती पुढे खूप मोठ्या प्रमाणावर जाईल, याची आम्हाला त्या वेळी कल्पना नव्हती.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला परिचित असलेले प्र. के. घाणेकर, डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. सचिन जोशी व रवींद्र लाड या तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधला. आम्हाला मिळालेल्या रचना खूपच पुरातन असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यावर अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हाती लागलेला खजिना कोकणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हे लक्षात आले. ही गोष्ट सर्वांसमोर जाण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केला; पण ती भेट म्हणजे आम्ही निवेदन देणे आणि त्यांनी ते गोड हसत स्वीकारणे, या पलीकडे काही नव्हते. आज हा विषय जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. असे असतानादेखील त्या खात्याचा प्रतिसाद आजपर्यंत तसाच आहे.
दरम्यानच्या काळात या शोधाच्या आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची उजळणी केली. आज सर्वज्ञात असलेला कातळ-खोद-चित्र हा शब्द त्या वेळी सर्वसामान्य माणसांना माहीतदेखील नव्हता. त्या संदर्भात एखाद्याला काही माहिती असल्यास त्याची ओळख निराळी होती. तज्ज्ञ मंडळींकडून मिळालेली माहितीही अत्यंत त्रोटक होती. आम्हाला आलेल्या अनुभवांतून आमची चौकशीची दिशा बदलली. कार्यप्रणालीमध्ये बदल केले. आमच्या बदलेल्या कार्यपद्धतीला यश आले. अल्पावधीतच आठ ते १० ठिकाणी असे काही तरी आहे, अशी माहिती समोर आली. आमची शोधमोहीम तीन टप्प्यांत विभागलेली होती. पहिला टप्प्यात मिळालेल्या संदर्भानुसार खात्री करण्याचा समावेश होता. त्यानुसार खात्री करण्यात आली आणि पाच-सहा ठिकाणी चित्ररचना असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
दुसऱ्या टप्प्याच्या मोहिमेची कल्पना तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना दिली. शिंदे सर म्हणजे एक निसर्गप्रेमी आणि वर्दीमागील संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समान आवडीच्या विषयातून ऋणानुबंध जुळून आले. आमच्या गप्पांमध्ये ते एक गोष्ट सातत्याने सांगायचे, की एखादे चांगले काम निःस्वार्थी भावनेने आणि सर्वस्व अर्पून हाती घेतले, की निसर्गही त्याला साथ देतो; आपल्या नकळत ते काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी तशी परिस्थिती निर्माण करतो. गरज असते ती ओळखण्याची. आमच्या कातळ-खोद-चित्रांच्या शोधमोहिमेत त्यांच्या या सांगण्याची प्रचीती आम्हाला सातत्याने येत गेली. त्यांनी लगेचच त्यांच्या परीने मदत देऊ केली. त्यांनी देऊ केलेली ही मदत मोलाची होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या मदतीचा आम्हाला फायदा झाला. लोकांशी संवाद साधणे सोयीचे गेले.
शोधाच्या या टप्प्यावर एकंदर पाच गावांचा समावेश होता. ही सर्व गावे राजापूर तालुक्यातील होती. (१) सफाईसाठी आवश्यक साहित्य व सोबत्यांसह भालावली गावाच्या सड्यावर पोहोचलो. परिसराची पाहणी करताना पुरातन गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन झाले. बहुतांशी चित्रपरिसर बाजूच्या रस्त्यामध्ये व गटारामध्ये नष्ट झाला होता. उर्वरित भागातील चित्रे शोधून साफसफाई केली. या चित्रांमध्ये गोपद्मसदृश भौमितिक रचना, मगर, वराह, पाऊल, ठसे वगैरे रचनांचा समूह मिळाला. या ठिकाणाची कथा येथे संपत नाही. पुढे आम्ही चालविलेल्या प्रयत्नांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने साथ दिली. या ठिकाणाच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला, असे कळले. या परिसराचा विकास तर सोडाच, परंतु याच ठिकाणी झालेल्या अन्य एका शासकीय कामात चित्रपरिसराला धक्क्का बसून दोन-तीन चित्रे कायमस्वरूपी नष्ट झाली आहेत. एकंदर घडलेल्या सर्व प्रकारातून लोकांची आस्था नक्की कशात आहे, यावर मात्र आमच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले.
बरोबर उलटा अनुभव सोलगावात आला. (२) तिथे पोहोचलो, तेव्हा त्या गावचे काही ग्रामस्थ आणि पोलीस पाटील वाट पाहत होते. गावातून घाटीने चित्रपरिसरात पोहचण्यास सुमारे अर्धा तास चालत जावे लागते. या ठिकाणी असलेल्या रचनांना एक आख्यायिका चिकटलेली आहे. सड्यावर वावरणारी गावातील वृद्ध मंडळी चित्रपरिसराला भोपळिणीचा वेल म्हणून ओळखतात. या वेलाचे मूद (मूळ) ज्याला सापडेले, त्याला संपत्ती मिळेल अशी धारणा. या समजापोटी या चित्रपरिसरात एका चित्रावर पहारीने खणल्याच्या खुणा आहेत. साफसफाई केल्यावर चित्ररचना स्पष्ट झाल्या. या रचनांमध्ये गवा रेडा, वाघ व एका अनाकलनीय चित्ररचनेबरोबर मोठ्या आकाराची भौमितिक रचना आढळून आली.
परतीच्या वाटेवर आपापसांत झालेल्या गप्पांमधून एक निराळीच गोष्ट समोर आली. या चित्रपरिसरापासूव थोड्या अंतरावर जांगळी लोकांचा देव आहे. या सड्यावर येण्यासाठी जेथून चालायला सुरुवात करतो, तिथे गांगो मंदिर (गांगेश्वर) आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा कोकणात हजारो वर्षांपासून आहे. येथे गांगेश्वराला कौल लावला जातो. कधीकधी गांगेश्वर कौल देत नाही. जांगळी लोक ज्या वेळी त्यांच्या देवाला कौल लावतात, त्या वेळी गांगेश्वर कौल देत नाही, असा समज इथे आहे. एक वेगळीच गोष्ट.
आपल्या गावातील प्राचीन ठेवा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन सोबत असलेल्या गावकऱ्यांनी दिले. त्यांचे हे आश्वासन राजकीय नेते, सरकार यांसारखे नव्हते. ती जागा मूळ मालकाने काही कारणास्तव विकायला काढली आणि असलेल्या चित्रांचे संरक्षण करण्याच्या अटीवर नवीन माणसाने ती जागा विकत घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या चित्रांभोवती तात्पुरत्या स्वरूपात का होईना, चिऱ्यांच्या दगडांची रांग लावून ती जागा कायमस्वरूपी अधोरेखित केली आहे. योग्य माहिती मिळाल्यावर पुरातन ठेवा जपण्यासाठी तेथील लोकांची धडपड खरेच कौतुकास्पद आहे.
असाच अनुभव आम्हाला देवाचे गोठणे या गावात आला. (३) लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार राजापूर तालुक्यातील हे सर्वांत मोठे गाव. या गावात कोकणाचा निर्माता श्री भार्गवरामाचे म्हणजेच परशुरामाचे मंदिर आहे. या मंदिराला सुमारे ३५०-४०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. इ. स. १७१० ते १७२०च्या दरम्यान ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी मूळच्या गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व श्री भार्गवरामाच्या मंदिराची स्थापना केली. येथे असलेली भार्गवरामाची मूर्ती आगळीवेगळी असून, अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. फरसबंदीयुक्त प्राकार असलेले मुघल-मराठा मिश्र शैलीतील हे मंदिर पाहणे, अनुभवणे हा एक स्वतंत्र विषय आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या देवाचे गोठणे गावाच्या सड्यावर व परिसरात निसर्ग नवलाई व आश्चर्येदेखील पाहायला मिळतात. मंदिराजवळच्या सड्यावर सुमारे साडेसात फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या रचनेची स्थानिक ओळख रावण अशी आहे. त्यावरून या सड्याला रावणाचा सडा असेही ओळखले जाते. सीतेच्या शोधात निघालेला रावण या ठिकाणी ठेच लागून उताणी पडला. त्याचा उमटलेला हा ठसा, अशी मजेशीर आख्यायिका या चित्ररचनेच्या बाबतीत सांगितली जाते. या चित्ररचनेच्या आजूबाजूला आणखीही काही रचना आहेत; पण त्या फार अस्पष्ट आहेत. या रचनांचा शोध घेत असताना आम्हाला एक अनोखी गोष्ट मिळाली.
गावागावातून चौकशी करणे, संदर्भ जाणून घेणे, मिळालेल्या संदर्भांनुसार ठिकाणाचा शोध घेणे, ठिकाणाची खात्री झाली की तिथे शोधमोहीम राबविणे, त्या जागेची साफसफाई वगैरे करत चित्ररचना उजेडात आणणे, जागेचा संपूर्ण तपशील नोंद करणे, दिशा, अक्षांश-रेखांश यांची नोंद करणे, जागेचा नकाशा बनविणे, चित्ररचनांचा नकाशा तयार करणे, आजूबाजूच्या विविध गोष्टींची नोंद घेणे, आख्यायिका, प्रथा वगैरे समजून घेणे… असे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले, तर त्या जागेचा संपूर्ण दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न आम्ही अंगीकारला होता.. अगदी सुरुवातीपासूनच.
या ठिकाणाचा असा दस्तऐवज तयार करताना त्या परिसरातील एका नैसर्गिक चमत्काराचा शोध आम्हाला लागला. तो चमत्कार होता चुंबकीय विस्थापनाचा. कातळचित्र आणि आजूबाजूच्या ठराविक परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई योग्य दिशादर्शन करत नाही, असे लक्षात आले. होकायंत्रातील चुंबकसुई उत्तर दिशा न दाखवता कधी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने, तर कधी विरुद्ध दिशेने, तर काही ठिकाणी ती स्वतःभोवती फिरतच राहते, हे लक्षात आले. एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काही वेळ विश्वासच बसेना. या ठिकाणी कोणत्या तरी चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव अधिक असल्याने हे घडत आहे, हे लक्षात आले; पण हा विषय सोबत असलेल्या ग्रामस्थांच्या आकलनापलीकडचा होता. एक तर या चित्रपरिसराला रावणाचा सडा म्हणतात. त्यामुळे काही ना काही श्रद्धा-अंधश्रद्धा चिकटलेल्या. त्यात त्यांच्या डोळ्यासमोर होकायंत्रातील गोलगोल फिरणारा काटा. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे भाव उमटले होते. त्यातूनच त्यांनी ‘साहेब आपल्या हातून कळत-नकळत काही चूक झाली आहे का? असेल तर आपण इथे नारळ देऊ या’ अशी विनंतीवजा सूचना केली. स्थानिक लोकांमध्ये या गोष्टी किती खोलवर रुजल्या आहेत, याचे दर्शन झाले.
चुंबकीय विस्थापन हे प्रकरण स्वस्थ बसू देत नव्हते, दगडातील चुंबकीय घटकांमुळे हे घडते आहे, हे जरी लक्षात आले असले, तरी नक्की काय हे जाणून घेण्याची धडपड चालू होती. भूगोल विषयातील नामांकित प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांची भेट घेतली. ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या चुंबकीय विस्थापन क्षेत्राचा प्राथमिक नकाशा तयार करण्यात आला. त्यातून पुढे आलेले अनुमान आणखी कोड्यात टाकणारे निघाले. जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दाखविणारी ही जगातील एकमेव जागा आहे हे आमच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोकणाच्या भौगोलिक व पर्यटनदृष्ट्या ही फार मोठी उपलब्धी आहे, यात शंका नाही. येथील चुंबकीय विस्थापन, तसेच जागामालक नीलेश आपटे व त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ, त्यांची मिळालेली साथ, तिथला परिसर हा अजून एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
येथून आमचा पुढचा प्रवास होता (४) हातिवले-अणसुरे मार्गावरील जुवाठी-उपळे गावातील. या ठिकाणी मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. ‘सातविणीच्या बुंध्याखाली’ एवढाच काय तो संदर्भ. सातवीण म्हणजे कातळ सड्यावर उंच वाढणारे एक झाड. या ठिकाणी एक मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. निवळी मार्गावरील रचनेसारखी. त्याच्या लगतच असलेली मातृदेवता असावी, अशी रचना लक्षवेधक आहे. आम्हाला या चित्राचा संदर्भ मिळाला होता. नोंद करत असताना एका लहानशा अपघातात जवळच असलेल्या तब्बल ३५ फूट लांब व २४ फूट रुंद अशा चित्ररचनेचा शोध लागला. ही रचना एका नजरेत सामावत नाही. या चित्ररचनेचा नकाशा तयार केल्यावर ती रचना एका उडणाऱ्या पक्ष्याची आहे हे लक्षात आले. एकंदर रचनेवरून हे चित्र ससाणा या प्रजातील पक्ष्याचे असावे, असे वाटते. तोंडात बोट घालायला लावणारे हे चित्र. या चित्ररचनेसोबत प्राणी, मासे, मनुष्याकृती वगैरे आठ-१० रचना या परिसरात आहेत.
या परिसरातील एक वेगळी प्रथा अनुभवायला मिळाली. ढोल-ताशा हा कोकणातील एक पारंपरिक वाद्य प्रकार. इथे दोन मेळ्यांमध्ये (गटांत) ढोल-ताश्यांच्या बोलातून स्पर्धा भरते. जाखडी नृत्यप्रकारात असणाऱ्या सवाल-जबाबसारखे सवाल-जबाब ढोल-ताश्यांच्या बोलातून एकमेकांसमोर ठेवले जातात. कोकणाची कला-समृद्धी दाखविणारा हा वाद्यप्रकार. (५) देवीहसोळ गावाच्या सड्यावर आर्यादुर्गा देवीचे मंदिर वसले आहे. उपळे येथे असलेल्या चौकोनी आकाराच्या मोठ्या रचनेसारखी, पण अत्यंत सुस्पष्ट रचना या मंदिराच्या परिसरात आहे. या चित्ररचनेच्या आजूबाजूला अस्पष्ट अवस्थेत आणखी काही रचना आढळून येतात.
मार्गशीर्ष वद्य अष्टमीला येथे उत्सव साजरा केला जातो. जवळच्या भालावली गावाची देवी पालखीतून आर्यादुर्गा देवीला भेटायला येते. भेटीपूर्वी देवीची पालखी मांडावर थांबते. हा मांड म्हणजे कातळ चित्रातील चौकोनी आकाराची उठावाची मोठी भौमितिक रचना. मांडावर पालखी ठेवल्यावर देवळातील गुरव त्या रचनेच्या मधोमध असलेल्या खड्ड्यावरील दगड बाजूला करून साप बाहेर काढून देवीवरून ओवाळून परत त्याला खड्ड्यात ठेवतो. हा साप देवीचे वाहन आहे, असे मानले जाते. या वेळी कोकणात आढळून येणारा अत्यंत धोकादायक आणि विषारी असा हा फुरसे नावाचा साप चावल्याची घटना आजतागायत एकदाही घडलेली नाही.
कातळचित्र आणि त्याच्याशी निगडित परंपरा असणारे हे एकमेव ठिकाण. लोकांशी झालेल्या बोलण्यातून तेथे असलेली रचना नक्की काय आहे याची माहिती कोणाला नाही, असे लक्षात आले. काही तरी वेगळे आहे, त्याचा देवतेशी संबंध असावा या विचारातून या ठिकाणी पालखी ठेवण्याची प्रथा सुरू झाली. या माहितीमुळे मुख्य रचनेच्या आजूबाजूला असलेल्या चित्रांची झीज होण्याचे कारणही समजले.
दरम्यानच्या काळात या शोधाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून बातमीवजा वृत्त प्रसिद्ध झाले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरून प्रसारण झाले. हा विषय बऱ्यापैकी सर्व लोकांपर्यंत पोहोचला. व्यक्तिगत चौकशी, वृत्तपत्रांतील बातम्या यातून नवीन संदर्भ हाती येऊ लागले. सगळेच संदर्भ बरोबर होते असे नाही; पण आपणहून पुढे येऊन माहिती द्यायच्या लोकांच्या प्रयत्नांना मान देणेही तेवढेच आवश्यक होते. शेकडो किलोमीटरची पायपीट चालू होती.
राजापूर तालुक्यातून मिळत असलेल्या संदर्भांबरोबर आता रत्नागिरी तालुक्यातून मिळालेल्या संदर्भांवर लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी-पावस मार्गावर (६) गोळप सड्यावर चित्र आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. येथे एका माकडाचे चित्र सापडले. त्याच्या बाजूला एक चौकोन अशी दोन चित्रे. निवळी-गणपतीपुळे मार्गावरील (७) करबुडे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी गोपद्मसदृश भौमितिक रचनांचा समूह आढळून आला. आकाराने कमी-जास्त असल्या, तरी सर्व रचना एकसारख्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य रचना येथे आढळून येत नाहीत. या भागाला गोनीचा कातळ म्हणून ओळखले जाते. धान्य वाहून नेणाऱ्या गाड्या या ठिकाणी जमिनीत रुतल्या, त्यांच्या चाकांचे उमटलेले हे ठसे, अशी आख्यायिका या चित्रपरिसराबाबत स्थानिक लोकांकडून सांगितली जाते. चित्रांचे आकार, त्यांचा पसारा पाहता आख्यायिका आणि चित्ररचना यांचा एकमेकांशी काही संबंध असावा, असे जाणवत नाही. काही गोलगोल रचना पाहून नंतरच्या कालखंडात ही आख्यायिका या चित्रांना चिकटली असावी, असे वाटले. एकाच प्रकारच्या रचना असलेले आतापर्यंतच्या शोधातील हे एकमेव ठिकाण.
एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून मेर्वी गावाच्या सड्यावरील चित्ररचनांचा शोध लागला. पावस-पूर्णगड मार्गावर असलेले हे गाव. मिळालेल्या संदर्भानुसार, या गावातील मधुकर गुरव ठिकाण दाखविण्यास सोबत आले. चालता चालता माहिती घेण्याचे काम सुरू होते. काही तरी चित्रविचित्र खुणा आहेत, त्यांचा काही अर्थ लागत नाही, असे त्यांचे सांगणे. त्यांनी एक आख्यायिका सांगितली. कोणे एके काळी या गावातील एका व्यक्तीला एक अनाहूत तेजःपुंज माणूस भेटला. ‘तुला संपत्ती देतो,’ असे सांगून तो त्याला चित्रपरिसरात घेऊन आला. तेथे असलेल्या एका मोठ्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. ही गुहा सोने-नाणे वगैरे गोष्टींनी भरलेली होती. गावातील त्या माणसाचा स्वतःवर विश्वास बसेना. ‘माझी अट पाळलीस, तर ही सगळी संपत्ती तुझी,’ असे सांगून ती तेजःपुंज व्यक्ती अंतर्धान पावली. घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे अवचितपणे त्याच्याकडून अटीचा भंग झाला. त्यानंतर एक मोठा आवाज होऊन ही गुहादेखील लुप्त झाली. त्या वेळी उठलेल्या खुणा म्हणजे तेथे असलेल्या चित्रविचित्र खुणा अशी ती गमतीशीर आख्यायिका होता.
बोलता बोलता चित्रपरिसरात पोहोचलो. काही रेषा कातळावर वाहून आलेल्या मातीखाली आपले अस्तित्व दाखवत होत्या. साफसफाई केल्यावर चित्रे स्पष्ट झाली. या चित्रांमध्ये गवा रेडा, हत्ती, डुक्कर, मगर अशा विविध प्राण्यांचा समूह आहे. या सगळ्या रचना जणू काही एकमेकांत गुंतल्या होत्या. त्यामुळे व्यवस्थित पाहिल्याशिवाय या रचना नक्की काय आहेत, हे समजणे जरा अवघडच. कदाचित याच बाबीमुळे काही चित्रविचित्र रचना म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले गेले. एकंदर रचना पाहून गुरव यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. एवढी वर्षे येथे वावरूनदेखील या रचना नक्की काय आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते, अशी कबुली त्यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सड्यावर (१०) दोन ठिकाणे आहेत. एका ठिकाणी एक मनुष्याकृती व त्यासोबत वराह आणि हरीण वर्गातील प्राण्यांच्या रचना आहेत. या रचना पाहण्यासाठी मात्र नजर तयारीची असणे गरजेचे आहे. दुसऱ्या ठिकाणी वाघ, मासा या रचनांसोबत काही प्राण्यांच्या पावलांचे ठसे व एक अनाकलनीय रचना असा समूह मिळाला. या दुसऱ्या ठिकाणाला रेडे पावलाचा सडा म्हणून ओळखले जाते.
या गावातील रहिवासी डॉ. गजानन रानडे यांनी एक आख्यायिका सांगितली. गावखडी गावाची देवी आणि शेजारील कशेळी गावाची देवी या दोघी एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी. या दोघींमध्ये काही कारणाने वितुष्ट आले. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. गावखडी देवीचे वाहन रेडा आणि कशेळी देवीचे वाहन वाघ. या दोघांमध्ये जोराची मारामारी झाली. या भांडणात जी देवी हरेल, त्या देवीने दुसऱ्या देवीच्या अंगणात कायम पाणी भरायचे, अशी अट आपापसांत ठरली. भांडणात कशेळी देवीचा पराभव झाला. या भांडणाच्या दरम्यान रेडा व वाघाच्या पावलाचे ठसे उमटले, ते म्हणजे चित्रपरिसरात दिसणारे पावलांचे ठसे. ठरल्या अटीप्रमाणे कशेळी देवीने पाणी भरायचे होते. गावखडीच्या गुरववाडीमध्ये बारमाही जिवंत पाण्याचा एक झरा आहे. हा झरा म्हणजे कशेळी देवी पाणी भरते, असे म्हटले जाते. हीदेखील एक वेगळीच आख्यायिका.
एव्हाना आमच्याकडे पुरेशी माहिती गोळा होऊ लागली होती. शोधातून मिळालेल्या चित्ररचनांची छायाचित्रे आमच्याकडे होती. लोकांशी संवाद साधताना ही छायाचित्रे आम्ही दाखवू लागलो. असे काही बघितले आहे का, हे विचारणे सोयीचे जात होते. त्यात राजापूर तालुक्यात (११) साखरकोंबे गावाचा संदर्भ हाती लागला. गावात केलेल्या चौकशीतून काहीच हाती लागत नव्हते. एक दिवस अचानक त्या गावातील लहान शाळकरी मुलांची गाठ पडली. गावातील लोकांबरोबर चाललेला संवाद त्या मुलांच्या कानावर पडला. आम्ही दाखवलेली छायाचित्रे त्यांनी पाहिली आणि मुलांनी त्यांच्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. लहान मुलांमधील निरीक्षण करण्याच्या उपजत वृत्तीतून त्यांच्या नकळत आपल्याला काही वेगळी माहिती मिळून जाते, याचा अनुभव आम्हाला आमच्या निसर्गभ्रमंतीमध्ये वेळोवेळी आला होता. त्यामुळे त्यांचा आग्रह न मोडता आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. सुमारे एक ते दीड किलोमीटर चालल्यावर त्यांच्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडे दूर पोहोचलो. त्यांनी पुरवलेली माहिती अचूक होती. शाळेतील मुले धड रस्त्याने जातील तर शपथ, असे म्हणायची पद्धत आहे. वेड्यावाकड्या रस्त्याने शाळा गाठायची. या वेड्यावाकड्या मार्गावरील ही चित्रे. या ठिकाणाचा आमच्या शोधाचा दुसरा टप्पा शाळेतील शिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार शाळेची सुट्टी संपल्यानंतर घेण्यात आला.
शोधाच्या दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेतील मुलांसह शिक्षकदेखील सहभागी झाले. तीन-चार ठिकाणी विभागलेला हा परिसर. या परिसरात मोठ्या चित्ररचनांचे प्रमाण खूप आहे. काही चित्ररचना शोधणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होते. जेमतेम काही इंच दिसणारी रचना साफ केल्यावर तब्बल २४ फूट लांब व तेवढी रुंद अशी ही भली थोरली. एकंदर ३०-३५ चित्ररचनांचा हा तीन-चार ठिकाणी विभागलेला परिसर, जिथे मोठ्या माणसांना आपल्या गावात काय आहे हे माहिती नाही, तिथे लहान मुलांच्या उपजत निरीक्षणवृत्तीतून पुढे आलेला. असाच अनुभव आम्हाला पुढे आणखी एका ठिकाणी आला.
आडिवऱ्यानजीक (१२) रुढे गावाच्या सड्यावर काही चित्रे आहेत. दोन-तीन फूट लांबी-रुंदीचे काही तरी आहे, एवढ्या माहितीवर प्रवास सुरू झाला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अत्यंत आगळीवेगळी आणि भलीथोरली रचना मिळाली. एखादे यंत्र असावे, अशी तब्बल २२ फूट लांब व २२ फूट रुंद अशी उठावाची भौमितिक रचना. या रचनेच्या लगत वाघ, देवमासा वगैरे रचनेसह मातृदेवता असावी अशी रचना मिळाली.
या चित्ररचना शोधत असताना एका अनाहूत व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार याच सड्यावर आणखी दोन ठिकाणे मिळाली. एके ठिकाणी विविध प्राण्यांच्या सुमारे ३० चित्रांचा समूह मिळाला. दुसऱ्या ठिकाणी तब्बल ९.६ फूट लांबीच्या मनुष्याकृतीसह प्राणी, गोपद्म यांचा समूह मिळाला. संबंधित जागामालकासह आजूबाजूच्या गावांतील जवळपास सर्वच लोकांना आपल्या येथे असे काही आहे, याची माहिती नव्हती. पुढे काही दिवस औत्सुक्यापोटी ही मंडळी सड्यावर या चित्ररचना पाहण्यासाठी जात होती, हे विशेष.
निनाद तेंडुलकर यांनी लांजा तालुक्यातील भडे गावात काही चित्रे असल्याचा संदर्भ दिला. (१३). या गावात दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी चित्ररचना आहेत. एके ठिकाणी तब्बल १४.६ फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याकृतीला खवण्या किंवा खवळोबा म्हणून ओळखले जाते. कुठली तरी दैवी शक्ती या परिसरात आहे, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे. यातूनच या परिसरातील गडग्याचे (कम्पाउंड वॉल) काम अर्थवट सोडून दिले आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, त्यामुळे येथील काही रचना नष्ट होण्यावाचून वाचल्या हे विशेष. या ठिकाणी आमचे काम चालू असताना एका अनाहूत व्यक्तीने आणखी माहिती पुरविली आणि अधिक चौकशी करण्याच्या अगोदर निघूनही गेली. (१४) हे ठिकाण होते लावगण गावाच्या हद्दीत. तिथे सात-आठ रचना आहेत. तिथेदेखील निवळीसारखी मोठी भौमितिक रचना आहे. या रचनेतील वेगळेपणाकडे आमचे लक्ष वेधले गेले. यातून आमचा सर्व चित्ररचनांचा तौलनिक अभ्यास सुरू झाला. याच वेळी आम्ही परत एकदा खूप पूर्वीपासून पाहत आलेल्या (१५) निवळी, व रामरोड या ठिकाणी भेट दिली. निवळी येथे चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. हे चित्र अर्धेअधिक शेजारील मार्गाखाली नष्ट झाले आहे. (१६) रामरोड येथे पाच चित्ररचनांचा समूह आहे. यात मनुष्याकृतीसह दोन प्राणी आणि एका पक्ष्याची रचना आहे. रामरोड येथील चित्रपरिसर जागामालकाने आपल्या परीने जपला आहे. एका आख्यायिकेतून या परिसराला चोर कट्टा असे म्हणतात. एकदा गावात मोठी चोरी झाली. चोराने चोरीचा माल घेऊन पोबारा केला. गावाच्या महापुरुषाने चोराला अडवले व त्यांच्यात मारामारी झाली. महापुरुषाने त्या चोराला उचलून आपटले. तो चोर जमिनीत गाडला गेला. त्या चोराचा उमटलेला ठसा म्हणजे येथे असलेली मनुष्याकृती. या मनुष्याकृतीची एकंदर ठेवण परग्रहवासी असावा अशी आहे.
चित्ररचनांचा शोध घेतल्यावर मिळालेल्या माहितीचे संकलन, वर्गीकरण चालू होते. त्यातून असे लक्षात आले, की मिळालेल्या रचनांमधील प्राण्यांच्या रचना या वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी मिळत्याजुळत्या आहेत. पक्षी या प्रकारातील काही रचना आकाराने खूपच भव्यदिव्य अशा आहेत. मनुष्याकृतींमध्ये वैविध्य आहे. भौमितिक रचनेतील आकारांमध्ये आणि विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण आहे. प्राणी, पक्षी, भौमितिक रचना, मनुष्याकृती या सर्व रचना खोदून निर्माण केलेल्या, रेषेने केलेल्या आहेत. भौमितिक रचनांचे आकलन होत नसले, तरी बाकी रचनांमधून ते चित्र नक्की कोणत्या प्राण्याचे, पक्ष्यांचे आहे, याचे आकलन नेटक्या पद्धतीने होते. मोठ्या चौकोनी आकाराच्या उठावाच्या भौमितिक रचना आणि त्यांच्या आजूबाजूला सापडणाऱ्या ढोपरापासून खाली पायाच्या रचना आपले वेगळेपण दाखवून देणाऱ्या अशा आहेत.
पूर्वीपासून ज्ञात रचना आणि हाती आलेल्या रचना यात असलेला फरक आणि वैविध्य तज्ज्ञ मंडळींच्या निदर्शनास आणले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. चित्रांचा आकार, त्यातील वैविध्य, त्यांचा पसारा या गोष्टी त्यांच्यासाठीदेखील नवलाच्या होत्या. अर्थात त्यांच्याकडून अधिक माहिती मिळणे कठीण झाले हे मात्र नक्की.
जे आहे ते आगळेवेगळे आहे, पुरातन आहे हे मात्र निश्चित होते. म्हणून पुरातत्त्व ख्यात्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी भा. वि. कुलकर्णी हे अधिकारी होते. परंतु ‘हा माझा विषय नाही. त्यामुळे मी याबाबत काही माहिती देऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. आमची निराशा झाली; पण त्या प्रसंगातून या विषयाचा अधिक खोलवर अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. तेथून सुरू झाला चित्ररचना शोधाबरोबर त्यांच्या निर्मात्याचा शोध.
शोध घेत असताना चित्ररचनांना असलेल्या धोक्यांबाबतदेखील अंदाज आला. पर्यटनाच्या अंगानेदेखील याचे महत्त्व, वेगळेपण आमच्या लक्षात आले. अभ्यास हा न संपणारा विषय आहे; पण त्यासाठी या गोष्टी टिकणे गरजेचे आहे. या विचारातून जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सविस्तर माहितीवजा निवेदन त्यांना सादर केले. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे सर यांची मोलाची मदत मिळाली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीदेखील सकारात्मक साथ दिली.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनादेखील हा विषय सांगितला. त्यांनी त्याला प्रतिसाद देऊन राजापूरच्या प्रांताधिकारी कार्यालयात तेथील अधिकारी व नागरिक यांच्याबरोबर एकत्रित बैठकीचे आयोजन केले. या बैठकीचे फलित म्हणजे राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पुढे त्यांचे मिळालेले सहकार्य अप्रतिम असेच. आमच्या शोधकार्यासाठी आता आम्हाला रत्नागिरीच्या तीन सक्षम अधिकाऱ्यांची साथ लाभली होती.
एका बाजूला याविषयी अभ्यास करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून शोध सुरू झाला, तर दुसऱ्या बाजूला या विषयातील माहीतगार व्यक्तींचा शोध. त्याचबरोबर शोधादरम्यान मिळालेल्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्या नकाशावरून एक आकृतिबंध तयार केला. इंटरनेटच्या माध्यमातून हाती माहिती मिळत होती; पण कोकणाशी संबंधित अगदीच त्रोटक माहिती उपलब्ध झाली. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडोपी येथे असलेल्या चित्ररचना कळल्या. त्या चित्ररचनांवर सतीश लळीत यांनी काम केले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे असलेल्या रचनेपलीकडे आणखी काही माहिती मिळाली नाही. कुडोपी येथील रचना नवाश्मयुगीन कालखंडातील असाव्यात, असे मत त्यांनी त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले आहे. गोवा राज्यात कुशावती नदीच्या किनाऱ्यावरदेखील अशा रचना असल्याचे इंटरनेटच्या माध्यमातून लक्षात आले.
एकीकडे अभ्यास चालू असताना नवीन ठिकाणांचे शोधकार्यदेखील चालू होते. ‘टिक्याच्या (ता. रत्नागिरी) कातळावर काही तरी आहे,’ एवढ्या संदर्भावर शोध सुरू झाला. गावात चौकशी करण्यासाठी गेलो असता एके ठिकाणी काही व्यक्ती भेटल्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आणखी एका ठिकाणाची माहिती समोर आली. (१७) हे ठिकाण होते उमरे गावाच्या सड्यावर. त्यांच्यातील माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी असे काही असल्याचे सांगितल्याचे आठवत होते. ‘हुमा बिलाच्या जवळ लावा तेम्बाच्या पलीकडे सातविनीच्या पल्याड’ असा हा संदर्भ. या संदर्भाच्या आधारे थोड्या शोधकार्यानंतर चित्ररचना मिळाल्या, ठिकाण निश्चित झाले. पहिला टप्पा पार पडला. परतीच्या वाटेवर सोबतची व्यक्ती सहेतुक आपल्यासोबत वावरत असल्याचा अंदाज आला. त्याचा खिसा गरम करून आणि ‘काही मिळाले तर कळवा’ असे सांगून निरोप घेतला. आमच्या एवढ्या प्रवासात अनुभवलेला हा असा पहिलाच प्रसंग.
या परिसरात तब्बल २४ चित्ररचनांचा समूह आढळून आला. यातील विशेष चित्र म्हणजे शार्क माश्याचे चित्र. गंमत म्हणजे ज्या ठिकाणाचा संदर्भ घेऊन पोहोचलो होतो, ते ठिकाण आजतागायत मिळालेले नाही.
निवळी गावडेवाडी येथे काही तरी आहे, अशी माहिती पुढे आली. (१८) गावडेवाडी परिसरात पोहोचलो, तेव्हा हा सर्व परिसर चिऱ्याच्या खाणींनी व्यापला आहे, हे निदर्शनास आले. थोडी माहिती घेण्याच्या प्रयत्नात एका वृद्ध माणसाची गाठ पडली. त्या व्यक्तीने शिल्लक चित्ररचना दाखवल्या. या रचनांमध्ये मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना, मातृदेवतासदृश रचना आणि विशेष म्हणजे तब्बल १५ फूट लांबीचा सर्प यासह एक वर्तुळाकार रचना आहे.
सुदैवाने शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीचा मालक तेथे आला. या चित्ररचनांना धक्का लावू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनीही प्राथमिक होकार दर्शवला. परतीच्या वाटेवर त्या वृद्ध माणसाने खंत व्यक्त केली. ‘आम्ही अभ्यासक आहोत,’ असे सांगून काही मंडळी या ठिकाणी पूर्वी येऊन गेली असल्याची माहिती दिली. परंतु पुढे काय? हे जपले पाहिजे वगैरे गोष्टी सांगतात; पण त्यावर कोणीच काही करत नाही. ही चित्रे पण लवकरच नष्ट होतील. बाकीच्या चित्रांसारखी. असे सांगून ‘तुम्ही स्थानिक काही करणार का,’ असा प्रश्न आमच्यासमोर मांडून ठेवला.
‘पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर खरोखरच या ठिकाणाने सोडवले. काही महिन्यांनंतर या ठिकाणी काही पर्यटकांसोबत आलो असता चिरा खाणमालकाने आपला शब्द पाळला नसल्याचे लक्षात आले. चित्ररचनांपासून अगदी जवळ चिरा खाणीचे काम सुरू करण्यात आले होते. लगेच हा विषय जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी तातडीने कारवाई करून खाणीचे काम बंद केले. तसेच अन्य कोठे असा प्रकार आढळून आला, तर संबंधित काम बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संबंधित कातळचित्रे ‘सात-बारा’वर नोंद करता येतील का, या दृष्टीने विचार करून, त्या ठिकाणची महसुली कागदपत्रे गोळा करण्याबाबतदेखील सूचना दिल्या. त्यामुळे कातळचित्र संरक्षणासाठी एक आश्वासक सुरुवात झाली.
येथे मिळालेल्या माहितीनुसार काही अभ्यासक भेट देऊन गेल्याचे पुढे आले. योगायोग कसा असतो… त्याचदरम्यान ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे प्राध्यापक मराठे यांची गाठ पडली. कला या दृष्टीने विचार केल्यास आढळलेली चित्रे, ती कोरण्याची पद्धती प्राथमिक अवस्थेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीकांत प्रधान यांचा संदर्भ दिला. त्यांना संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. अशोक मराठे, प्रधान सर व सुबोध शिवलकर ही टीम कोकणातील प्राचीन बंदरे या विषयावर काम करत असताना त्यांना एक-दोन ठिकाणी चित्ररचना आढळलेल्या होत्या. त्यांच्या बोलण्यातून व त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखातून पालशेत, निवळी व देवीहसोळ या ठिकाणांचा उल्लेख समोर आला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी कोत्रे हिने कापडगावात चित्रे असल्याची माहिती दिली. आमच्या शोधात प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळी रचना समोर येत होती. (१९) कापडगावातदेखील वेगळी रचना समोर आली. थोड्या वेगळ्या शैलीतील सुमारे १४ चित्ररचनांचा समूह या ठिकाणी आहे. येथे असलेले समुद्री कासवाचे चित्र आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेले. या चित्ररचनांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला भुताचा सडा म्हणतात. लांबलचक पसरलेल्या सड्यावर मध्येच एक भाग काहीसा वेगळा आहे. गवताची एक काडीदेखील इथे उगवत नाही. ‘या भागावर भुताने घाण करून कुल्ले घासले. म्हणून या भागात काही उगवत नाही,’ अशी गावातील लोकांची धारणा आहे. विस्तीर्ण कातळसड्यावर काही भागात गवताची एक काडीदेखील उगवू नये, ही खरेच नवलाची गोष्ट आहे.
राजापूर तालुक्यात (२०) सोगमवाडी येथील चित्ररचना शोधत असताना त्या गावातील एका माणसाची मदत घेतली. त्याने त्यांचे देव जिथे पूजतात, त्या ठिकाणाचे दर्शनदेखील घडवून आणले. लेणे असावे असे हे डोंगराच्या एका कपारीत असलेले स्थान. याच्या बाजूला पाण्याचा एक ओढा आहे. या पाण्याच्या साठ्याला हे लोक देव मानतात आणि पूजा करतात. (२१) आडिवरे गावाजवळ कोंडसर खुर्द येथील रचनांमध्ये माकडाच्या रचनांचा समावेश आहे. याच पठारावर दुसऱ्या टोकाकडे असलेल्या (२२) राजवाडी वाडीखुर्दच्या सड्यावरील चित्रपरिसर शोधण्यासाठी गावाच्या माजी सरपंचांची मदत झाली. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चित्रांमध्ये एखादे चित्र नेहमी नवीन कोडे निर्माण करत होते. इथेही तोच प्रकार. प्राण्याच्या पोटात मनुष्याकृती कोरल्याचे इथे आढळून आले. या परिसरात सात-आठ चित्ररचना आढळून आल्या. तेथील कथा अजून वेगळी. शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीच्या परिसरात आणखी काही रचना आहेत हे नंतरच्या कालावधीत पुढे आले. राजापूरचे प्रांताधिकारी खांडेकर यांनी तातडीने लक्ष घालून ही चिरा खाण बंद केली. खांडेकर हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व. राजापुरातील पर्यटनवाढीसाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून नवदुर्गा दर्शन या वेगळ्या पर्यटनपूरक ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा कोकणातील हा पहिलाच पर्यटनप्रयोग होता. खांडेकरांनी कातळचित्रांबाबत त्यांच्या क्षेत्रात आढळून आलेल्या चित्रठिकाणांची कागदपत्रे गोळा करून कातळचित्रांची नोंद सात-बारा दप्तरी व्हावी, यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवून दिला. त्यांचे संपूर्ण सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले.
पावसामुळे प्रत्यक्ष शोधाच्या प्रवासाला थोडी खीळ बसली. या कालावधीत चित्रांचे वर्गीकरण, मिळालेल्या ठिकाणांचा अक्षांश- रेखांशांच्या साह्याने एकत्रित नकाशा तयार केला. तज्ज्ञ लोकांकडून मिळालेली माहिती, या अगोदर काही ठिकाणांबाबत प्रसिद्ध झालेली माहिती याबाबत साकल्याने विचार झाला. ठाकूरदेसाई सरांमुळे एकंदर भौगोलिक रचनेचा अभ्यास करता आला. चित्रांच्या वर्गीकरणाच्या वेळी प्राणिशास्त्रातील मित्रांची मदत घेतली. त्यातून रचनेतील प्राणी नक्की कोणते हे जाणून घेणे शक्य झाले. त्यातून चित्ररचनेमध्ये मिळालेले सर्व प्राणी हे जंगलातील (वाइल्ड) आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. निवळी येथील मोठ्या चौकोनी आकाराच्या भौमितिक रचनांसारख्या रचना अन्यत्रही आढळून आल्या. त्या रचना प्रथमदर्शनी सारख्या दिसत असल्या, तरी त्यात खूप फरक आहे. आजपर्यंत मिळालेल्या संदर्भानुसार, यापूर्वी फक्त निवळी, देवीहसोळ, उमरे व बारसू याच ठिकाणी तज्ज्ञ लोकांनी भेटी दिल्या असल्याचे आढळून आले. त्यातून त्यांनी काढलेल्या अंदाजांचा पुरेसा मेळ आमच्या शोधात आढळलेल्या रचनांशी होत नसल्याचेदेखील लक्षात आले. उदा. बारसूच्या सड्यावर ज्या चित्ररचनेला तज्ज्ञ लोकांनी भेट दिली आहे, त्यांनी तिथे असलेल्या एका रचनेला दिशादर्शक चिन्ह असे संबोधले आहे. प्रत्यक्षात ते दिशादर्शक चिन्ह नसून, ती वाघळी माशाची चित्ररचना आहे.
एकंदर चित्ररचनांच्या ठिकाणचा पसारा लक्षात आला. त्यावरून आणखी कोठे चित्ररचना असू शकतील, याचा अंदाज बांधून चौकशी सुरू केली. मिळालेली माहिती कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊ लागलो. वेगवेगळ्या माध्यमांतून अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालूच होता. आलेल्या अनुभवांतून शोधपद्धतीतदेखील थोडा बदल केला. सरकारदरबारी थोडा अधिक प्रयत्न चालू केला. पुढे येत असलेल्या माहितीतून भारतात अन्यत्र असलेल्या अशा प्रकारच्या चित्ररचनांपेक्षा वेगळ्या रचना, त्यांची निर्मितीची पद्धत यातील फरक स्पष्ट होऊ लागले. वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था यामध्ये केलेल्या कार्यक्रमांतून कातळ-खोद-चित्रे हा शब्द सर्वांपर्यंत पोहोचला. नाही म्हटले तरी काही प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश आले.
पाऊस कमी होताच शोधमोहिमेच्या पद्धतीत केलेल्या बदलानुसार चौकशी सुरू झाली. (२३) गणपतीपुळे रस्त्यावरील चवे-देऊड या गावाच्या सड्यावर चित्रे असावीत, असा आमचा अंदाज त्याच गावच्या विलास काळेंकडे बोलून दाखवला. त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन माहिती घेतली आणि खरोखरच त्या गावाच्या सड्यावर चित्रे असल्याचे निश्चित झाले. या ठिकाणी १४-१५ चित्ररचनांचा समूह आहे. यातील १८ फूट लांबीची एकशिंगी गेंड्याची चित्ररचना आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेली. एकशिंगी गेंड्याचे वास्तव्य सध्या अखंड जगात फक्त आसाममध्ये आहे. मग त्याची चित्ररचना इथे कशी काय? अद्याप कोकणात त्याच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत.
(२४) परचुरी गावाच्या सड्यावर १५-१६ चित्ररचनांच्या ठिकाणी एक आख्यायिका ऐकायला मिळते. मुलीच्या लग्नाचे संपूर्ण वऱ्हाड कोवळ्या कातळात बुडाले. त्यांच्या उमटलेल्या खुणा म्हणजे इथली कातळचित्रे. चित्ररचनांमध्ये दिसणाऱ्या आकारांना ‘ही दागिन्याची पेटी, हातातला नारळ,’ वगैरे पद्धतीने वृद्ध मंडळींकडून ओळखले किंवा सांगितले जाते.
इथल्या आख्यायिकेने आम्हाला नक्कीच विचारात टाकले. कातळात एखादी गोष्ट कशी काय गाडली जाऊ शकेल. कोवळा कातळ म्हणजे काय? मग प्रवास सुरू झाला आख्यायिका उलगडण्याचा. कोकणात कातळ सर्वत्र असला, तरी त्याच्या काठिण्यात फरक आहे. कोठे तो फार कडक आहे, तर कोठे नरम. याला या कातळाच्या निर्मितीमागील प्रक्रिया कारणीभूत आहे. जेथे कोवळ्या कातळात वऱ्हाड बुडाले, ही आख्यायिका ऐकायला मिळते, तिथे असलेला कातळ नरम आहे. मग अशा बुडणे, गाडणे अशी आख्यायिका असलेल्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती परत एकदा नजरेखालून घातली. आणि अशा प्रकारच्या आख्यायिकांमागील गर्भितार्थ उलगडला. या चित्ररचना आणि आख्यायिका यांचा कोणताच संदर्भ एकमेकांशी नाही. कातळसड्यावर काहीशा गूढ वाटणाऱ्या या रचना पाहून त्याभोवती वेगवेगळ्या आख्यायिका गुंफल्या गेल्या; पण या आख्यायिकांतून तेथील भौगोलिक परिस्थिती काय असावी, याची माहिती मिळते.
परचुरीच्या या सड्यावर असताना आमची एका हरहुन्नरी व्यक्तीशी गाठ पडली. ती व्यक्ती अनोळखी तर नव्हतीच. आमचा चांगला मित्र मिलिंद खानविलकर. उक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार सध्या या व्यक्तीच्या खांद्यावर आहे. आम्ही त्याला सूचना केली, ‘तुमच्या गावाच्या सड्यावरदेखील अशा रचना आहेत. एकत्र शोध घेऊ.’ उक्षी गावाचा सडा परचुरी, करबुडे, जांभरुण यांच्या मधला. या सर्व ठिकाणी चित्ररचना आहेत. (२५) जांभरुण गावाच्या सड्यावर तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि शैलीच्या मनुष्याकृती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. या परिसराला राक्षसाची जाल असे म्हणतात.
करबुडे, जांभरुण, परचुरी येथील माहिती मिलिंदला दिली. रचना कशा शोधायच्या, याची कल्पना त्याला दिली. खरेच अत्यंत उत्साही अशा मिलिंदचा दोन दिवसांतच निरोप आला. (२६) उक्षी गावाच्या सड्यावर चार-पाच ठिकाणी मिळून सुमारे चाळीसेक चित्ररचना या ठिकाणी आहेत. एके ठिकाणी फक्त लहान-मोठ्या भौमितिक रचना आहेत. दुसऱ्या ठिकाणी असलेली चित्ररचना लक्षवेधक आहे. तब्बल १८ फूट लांब व तेवढी रुंद अशी हत्तीची रचना.
मधल्या कालखंडात आमचे सरकारदप्तरी प्रयत्न चालूच होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आमच्या कामाचे महत्त्व ओळखून, ग्रामीण पर्यटन विकास योजनेमध्ये कातळचित्रांच्या ठिकाणांचा समावेश केला आणि आपल्या परीने संपूर्ण मदत देऊ करण्याचा प्रयत्न केला. तसे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळत असलेले सहकार्य वादातीत होते. अशी दुर्मीळ उदाहरणे असतात. त्यात आम्ही एक होतो.
देशभ्रतार यांनी घेतलेला पुढाकार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याला उक्षीचे सरपंच मिलिंद यांनी खऱ्या अर्थाने चांगला प्रतिसाद दिला आणि कातळचित्राच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग करून घेतला.
दरम्यानच्या काळात आमच्या पाठी उभ्या असलेल्या या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली. अर्थात सरकारदरबारी नवा गडी नवे राज्य सुरू झाले. ते प्रयत्न एका बाजूला चालू असताना दुसरीकडे शोधकार्य चालूच होते.
प्र. के. घाणेकर यांच्यामुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ या अंकातून लेख प्रसिद्ध झाला. आशुतोष बापट यांची सरांमुळे ओळख झाली. त्यांची मदत सातत्याने होत होती आणि आहेही.
एका बाजूला अप्रतिम सहकार्य मिळत होते, तर काही प्रसंगी वाईट अनुभवदेखील पदरात पडत होते. इतिहास या विषयात अनेक वर्षे काम करणाऱ्या एका संस्थेने आमच्याकडून माहिती घेऊन वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न चालविला. या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटले. ज्ञानदानाच्या क्षेत्रातील या गोष्टीची खंत वाटली.
शोधात नवनवीन ठिकाणांची भर पडत होती. (२७) कोतापूर, (२८) शेडे, (२९) नाटे, (३०) विखारे गोठणे, (३१) जयगड, (३२) कुरतडे, (३३) मासेबाव, (३४) रावारी, (३५) हर्चे, (३६) भडे, (३७) बेनी, (३८) कोळंबे अशी विविध ठिकाणे. प्रत्येक ठिकाणची चित्रे वेगवेगळी. काही ना काही कोडे निर्माण करणारी आणि आख्यायिकांपासून दूर. या सर्व प्रवासात आलेल्या अनुभवातून मिळालेल्या सर्व ठिकाणांचा परत एकदा साकल्याने विचार केला. त्यातून चवे देऊड पंचक्रोशीत (३९) चवे गावी नवीन ठिकाण समोर आले. देवीहसोळ परिसरात अनेक चित्ररचना मिळाल्या. बारसूच्या सड्यावर आणखी खूप मोठा खजिना हाती लागला. यापूर्वी अभ्यासकांनी मांडलेली मते, गृहीतके यांचा नव्याने अभ्यास करणे गरजेचे आहे, हे आमच्या शोधकार्यात आलेल्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. बारसूच्या सड्यावर मिळालेल्या खजिन्याने ही गोष्ट अधोरेखित केली आहे.
कातळचित्रांच्या शोधाबरोबर आम्ही आडवळणावरचे कोकण जवळून अनुभवत होतो. जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांची ओळख होत होती. पक्षी कुळातील वेगवेगळ्या प्रजातींची भर पडत होती. कास पठाराएवढे सौंदर्य कोकणातील या कातळसड्यांवर अनुभवायला मिळत होते. कोकणातील जैवसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या बिबट्याचे दर्शन हे आमच्या दृष्टीने नेहमीचेच झाले.
गोवळ गावच्या टिपऱ्या, जैतापूर येथील खारवी समाजातील समई नृत्य, राजापुरातील शिमगोत्सवातील रोम्बाट ही आगळीवेगळी प्रथा, धनगर समाजातील गजा नावाचा नृत्यप्रकार, भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची प्रथा, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कोकणची समृद्धी अलगद उलगडली जात होती.
उक्षीतील ग्रामस्थ आणि सरपंचांच्या पुढाकाराने झालेले कातळ-खोद-चित्राचे संरक्षण
शिंदे सरांचे शब्द अगदी खरे होते. कोकण विभागीय आयुक्त म्हणून डॉ. जगदीश पाटील यांची बदली झाली. त्यांना या विषयात विशेष रुची आहे. त्यांच्या येण्याने सरकारी पातळीवर काहीशा रेंगाळलेल्या विषयाला गती मिळाली. त्याचदरम्यान रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांची गाठ पडली. त्यांच्याकडून लाभत असलेल्या मदतीबाबत सांगण्यास शब्द अपुरे पडतील. खरे सांगायचे झाले, तर ते आमच्या टीमचे एक सहकारी बनून गेले आहेत. योगायोग म्हणजे महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक म्हणून तेजस गर्गे यांच्याकडे कारभार सोपविला गेला. गर्गे सर स्वतः पुरातत्त्व शास्त्रज्ञ. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या विभागाला याच विषयातील व्यक्ती संचालक म्हणून तब्बल २२ वर्षांनी लाभली. आमच्या शोधाच्या दृष्टीने ही खूप महत्त्वपूर्ण अशी बाब. त्यांची गाठभेट झाली आणि कातळचित्र या विषयाला ‘बुलेट ट्रेन’ची गती मिळाली. कातळचित्रांच्या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आजही ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
मधल्या कालखंडात या विषयाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. सरकारदरबारी ही चित्रठिकाणे संरक्षित करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत सातत्याने विचारविनिमय चालू आहे. त्यात अमित शेडगे यांच्याबरोबर लोकसहभागातून ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सूचित केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. याही वेळी मिलिंद खानविलकर उभे राहिले आणि बघता बघता लोकसहभागातून उक्षी येथील गजराज संरक्षित झाले. जागामालक, स्थानिक ग्रामस्थ यांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ लाभली, तर काय होऊ शकते, याचे एक जिवंत उदाहरण उभे राहिले. चित्र संरक्षित झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांत सुमारे सात हजारांहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. स्वाभाविकच त्याचा परिणाम स्थानिक व्यापारी वर्ग व जनतेला झाला आहे. अखंड महाराष्ट्रात प्रागैतिहासिक ठिकाण लोकसहभागातून संरक्षित झाल्याचे हे पहिलेच उदाहरण. हा मान उक्षी या लहानशा ग्रामपंचायतीने पटकावला. मिलिंद खानविलकर यांच्यासारखे सरपंच सर्वत्र लाभले तर कोकणाचा शाश्वत विकास होण्यास वेळ लागणार नाही.
कातळ चित्रांबरोबर आमचा मंदिरांवरही अभ्यास होत होता. मंदिरातील वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. आज जगाच्या पाठीवर पोहोचलेले दशावतारी खेळे सर्वांना ज्ञात आहेत; पण कधीतरी लुप्त पावलेल्या या कलेला आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुनरुज्जीवन मिळाले आहे, हे कीती लोकांना ठाऊक आहे? गणेशगुळ्यातील लक्ष्मी- दामोदरची दुर्मिळ मूर्ती, गोवळमधील ब्रह्मदेवाची अत्यंत सुरेख मूर्ती, साटवलीमधील गुप्तकालीन विष्णूमूर्ती, अशी एक ना दोन… कोकणाचे वैभव असणारी ही मंदिरे.
मध्यंतरीच्या कालखंडात आणखी एक ठिकाण मिळाले. (४१) कशेळी. राजापूर तालुक्याच्या उत्तर टोकावर वसलेले हे गाव. या गावाच्या सड्यावर एका भल्या थोरल्या चित्ररचनेशी आमची गाठ पडली. ‘अबब’ हाच शब्द त्या रचनेला योग्य. सुमारे ५० फूट लांब व ४० फूट रुंदीची ही हत्तीची चित्ररचना. ही चित्रे नीटनेटकी पाहायची झाल्यास आपल्याला हवेत किमान ५० फूट जावे लागते. या रचनेमध्ये विविध प्राणी, पक्षी, जलचरही कोरलेले आहेत. तब्बल ८० चित्रांचा एकत्रित समूह. भारतातील या प्रकारातील एखाद्या प्राण्याचे हे सर्वांत मोठे चित्र. या परिसरात एकंदर १२५ चित्ररचना आहेत. आजपर्यंत आमच्या शोधात मिळालेला हा सर्वांत मोठा समूह. या चित्ररचनेने परत एकदा वेगळ्या विचारांना गती दिली.
चित्ररचनांना राज्य संरक्षित स्मारकांचा दर्जा देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ऋत्विज आपटे यांची नेमणूक करण्यात आली. आपटे स्वतः पुरातत्त्व अभ्यासक. त्यांच्यासोबत महसूल खात्याच्या अधिकारीवर्गाबरोबर सर्व ठिकाणांचा एकत्रित सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेदरम्यान आपटे यांच्या ज्ञानाचा आम्हाला अधिक उपयोग झाला. तत्कालीन मानवाने वापरलेली दगडी हत्यारे आम्हाला मिळाली. कातळ-खोद-चित्रांच्या कालनिश्चितीसाठी थोडीफार का होईना, एक दिशा मिळाली.
या सर्व्हेदरम्यान माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा पाहायला मिळाल्या. सर्व्हेवेळी उमरे गावात गेलो. त्या वेळी गावातील ४०-५० माणसे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा विरोध होता. ‘आमची जागा आहे. आम्ही देणार नाही,’ वगैरे गोष्टींनी सुरुवात झाली. ती माणसे आम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हती. ही चित्रे पुरातन नाहीत, असे त्यांचे सांगणे होते. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादात त्यांच्याच बोलण्यातून ही चित्रे कोणी कधी निर्माण केली हे माहिती नसल्याचे निदर्शनास आणून दिले, तेव्हा कुठे राग थोडा शांत झाला. या चित्रांचे महत्त्व, त्यामुळे गावाला होणारा फायदा या बाबींची कल्पना दिली. कोकणी माणसाची टिपिकल ओळख ही मंडळी बाजूला ठेवतील अशी अपेक्षा. उक्षीचे उदाहरण सर्व लोकांनी समोर ठेवले, तर या चित्रांचे संरक्षण नक्कीच शक्य आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत.
शोधप्रवास आजही चालूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील आमचा प्रवास सुरू झाला आहे. आजमितीस ५२ गावांतून सुमारे ९० ठिकाणी १२००हून अधिक कातळ-खोद-चित्ररचना शोधण्यास यश मिळाले आहे. खरे म्हणजे प्रत्येक ठिकाणावर एक स्वतंत्र लेख होईल.
या चित्ररचना का कोरल्या गेल्या? त्यामागील उद्देश काय? चित्ररचनेतील गेंडा, पाणघोडा हे प्राणी कधी काळी कोकणात अस्तिवात होते का? त्यांचा कालखंड कोणता? या रचना एकाच कालखंडात कोरलेल्या आहेत की वेगवेगळ्या? देव, धर्म, भाषा या गोष्टी त्या माणसाला माहिती होत्या का? मानवी उत्क्रांतीचे गूढ आणि अगम्य प्रश्न घेऊन ही कातळचित्रे आपणासमोर उभी आहेत.
कातळ-खोद-चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली मिळालेली दगडी हत्यारे यांचा विचार करता या रचना निर्माण करणारा मानव भटका होता. अन्न मिळविण्यासाठी तो पूर्णपणे शिकारीवर अवलंबून होता. शेतीचे ज्ञान त्याला अवगत झाले नव्हते असे दिसते. यातून या रचना इसवी सन पूर्व १० हजार ते १२ हजार या कालखंडातील असाव्यात, असा अंदाज तज्ज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे. अश्मयुगीन कालखंडातील या रचना भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थात अधिक सखोल अभ्यासाची आणि अधिक पुराव्यांची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे.
एक महत्वाआहची बाब म्हणजे या शोधाची दखल बीबीसी, दी हिंदू, लाइव्ह इंडिया, हिस्टरी डॉट कॉम यांसारख्या जगातील अग्रगण्य प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. त्यामुळे अन्य देशांतील तज्ज्ञ, पर्यटकही कोकणाकडे वळू लागले आहेत. कातळ-खोद-चित्रांचा शोध, संरक्षण व संवर्धन या आमच्या विषयाला आता योग्य बळ मिळू लागले आहे. आमचा हा प्रवास पूर्णपणे तन, मन, धन अर्पून चालू आहे. आजपर्यंत एक नया रुपयाचीही मदत संस्था, सरकार किंवा व्यक्ती अशा कोणाकडूनही मिळालेली नाही. हे मुद्दाम लिहायचे कारण, की महाराष्ट्र सरकारने २४ कोटी रुपयांची घोषणा केली आहे; पण ती फक्त घोषणा आहे. कोकणाच्या सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी जपण्यासाठी सर्वांच्या साथीची गरज आहे.
कातळचित्रांच्या शोधात आम्हाला फक्त ती चित्रेच मिळाली, असे नव्हे, तर आडवळणावरील कोकणाचे खरेखुरे सुंदर रूप आमच्यासमोर उलगडले. माणसांच्या स्वभावांचे अंतरंग उलगडले, कातळचित्रे म्हणजे फक्त चित्रांचा अभ्यास नव्हे. तो अभ्यास आहे पुराशास्त्राचा, माणसाच्या उत्क्रांतीचा, भौगोलिक गोष्टींचा, जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांचा. भौतिक आणि रसायनशास्त्राचा. म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण असा हा विषय आहे.
संपर्क : ९४२२३ ७२०२०, ९४२३२ ९७७३६
ई-मेल : bhairisbud@gmail.com
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)
pudhari.news
सिंधुदुर्ग : वाघबावली येथील कातळशिल्पावर नवा प्रकाश; थक्क करणारी माहिती आली समोर
पुढारी वृत्तसेवा
9–11 minutes
Sindhudurg News
वाघबावली येथे दोन वर्षांपूर्वी सापडलेले कातळशिल्पPudhari Photo
Published on:
16 Jan 2025, 6:49 pm
Updated on:
16 Jan 2025, 6:49 pm
देवगड : दोन वर्षांपूर्वी देवगड तालुक्यातील साळशी येथे उभ्या लँटराईट जातीच्या दगडावरील काही जंगली प्राण्यांची कातळचित्रे इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना सापडली होती. तेथून परतत असताना संध्याकाळच्या अंधारात शिरगाव येथील वाघबावली नावाच्या ठिकाणी एक नवे कातळशिल्प सापडले होते. त्याविषयीचा आपला रिसर्च पेपर पुरातत्व अभ्यासक रणजीत हिर्लेकर यांनी भारतीय- मूर्तीशास्त्र आणि स्थापत्य संशोधन परिषदेच्या पाचव्या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय अधिवेशनात सादर केला.
पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे दोन दिवसीय पाचवे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या परिषदेला देशभरातील अनेक राज्यांमधील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. त्यामध्ये पुरातत्व अभ्यासक रणजित हिर्लेकर यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यावेळी सत्रप्रमुख म्हणून आर. एच. कुलकर्णी व डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत गणवीर हे उपस्थित होते.
हिर्लेकर म्हणाले, शिरगाव येथील कातळशिल्प समतल करण्यासाठी कलाकाराने कोणते साधन वापरले असेल? कसल्याही लोखंडी हत्याराविना असे अचूक कोरीव काम करणे अवघड आहे. हे चित्र काढण्यासाठी माणसाला भूमितीची व गणितीय ज्ञानाची आवश्यकता आहे? त्याविना अशी भौमितिक चित्र कोरणे कसे शक्य व्हावे? असे अनेक प्रश्न उपस्थित करीत आपले निष्कर्ष मांडले. या कातळशिल्पाचा कर्ता चांगलाच प्रगत मानव असला पाहिजे. हे कातळशिल्प द्विमीतीय चित्रकलेकडून त्रिमितीय शिल्पकलेच्या दिशेने मानवाचा सुरू असलेला प्रवास अधोरेखित करते. अशात-हेचे वर्तुळ कोरण्यासाठी कलाकाराला भूमितीय गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. अंक गणिताचीही माहिती असायला हवी. मोजपट्टी वापरण्याचे ज्ञान आवश्यक आहे. अन्यथा इतके मोठे चित्र कोणत्याही साधनाविना, गणिताविना काढणे अशक्य आहे. वाघाच्या आकाराविषयीचे शरीरशास्त्रीय ज्ञान हवे. हे ज्ञान मिळविण्यासाठी तत्कालिन मानवाला आवश्यक ती स्थिरता व समृद्ध जीवन उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
या अधिवेशनात आदित्य फडके व प्रा. अरविंद सोनटक्के यांच्या 'सुरसुंदरी देवांगना की नायिका' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी देशभरातील विविध राज्यातून आलेल्या मूर्ती व स्थापत्य कलेतील मान्यवर उपस्थित होते. या अधिवेशनातील इतिहास अभ्यासकांची पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर महादेव मंदिराच्या अभ्यास दौऱ्याने या परिषदेची सांगता झाली.
marathivishwakosh.org
प्रागैतिहासिक कला, भारतातील (Prehistoric Art in India)
Post author:माणिक वालावलकर
9–11 minutes
मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या प्रथम कालखंडास प्रागैतिहास अशी संज्ञा दिली जाते. त्याचे स्थूलमानाने प्रागैतिहास, आद्य इतिहास (protohistory) व इतिहासकाळ असे तीन प्रमुख कालखंड मानले जातात. प्रागैतिहास या संज्ञेचा प्रथम वापर डॅन्येल विल्सन यांनी केला. प्रागैतिहासिक काळाचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात लेखनकला, स्थिर जीवन, धातूंचा वापर, योजनाबद्ध वसाहत वा अन्नोत्पादन यांचा पूर्णत: अभाव आढळतो. हा कालखंड सर्वांत मोठा असून त्याचा अभ्यास उत्खनित पुराव्यांद्वारे करावा लागतो. आद्य इतिहास कालखंडाचे लिखित पुरावे उपलब्ध असतात; परंतु त्यांचा उलगडा करता आलेला नाही, मात्र तत्संबंधी लिहिले गेले आहे. तर इतिहासकाळाचे लिखित पुरावे उपलब्ध असतात व ते वाचून त्याची उकल करणे शक्य असते. म्हणूनच इतिहासकाळाच्या पूर्वीचा काळ हा सर्वसाधारणपणे प्रागैतिहासिक काळ म्हणून ओळखला जातो. या तीनही संज्ञा काहीशा कृत्रिम आहेत. त्यांत प्रदेशपरत्वे फरक आढळतो. कारण त्या कालबद्ध वा प्रदेशनिबद्ध नाहीत. आजही पाषाणयुगीन जीवन जगणाऱ्या काही जमाती अस्तित्वात आहेत.
प्रागैतिहासिक कलेचे नमुने पुढील माध्यमांत विशेषत: आढळतात.
(१) गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावर काढलेली चित्रे; (२) गुंफांच्या भिंतींवर आणि प्रस्तराधारित कातळावरील उत्कीर्णन; (३) प्राण्यांच्या मातीच्या मूर्ती; (४) अपोत्थित शिल्पे; (५) दगड, हाडे वा शिंगे यांसारख्या वस्तूंवर केलेली चित्रकारी अथवा उत्कीर्णन.
या काळातील गुंफा प्रामुख्याने मध्य भारतातील सिंगनपूर, आदमगढ, चक्रधरपूर, मिर्झापूर, हुशंगाबाद, लिखुनिया, भलदरिया, विजयगढ, पंचमढी इत्यादी ठिकाणी आढळतात आणि त्यांतून भित्तिचित्रे काढलेली आहेत. या गुंफांव्यतिरिक्त भीमबेटका येथे अतिप्राचीन प्रस्तर गुंफा असून त्यांचा शोध पुरातत्त्वज्ञ वि. श्री. वाकणकर यांनी लावला.
एडक्कल, वायनाड, केरळ येथील गुंफाचित्रशिल्प
भारतातील प्रागैतिहासिक गुंफाचित्रे प्रामुख्याने दोन प्रकारची आहेत. त्यांतील पहिला प्रकार म्हणजे रंगीत गुंफाचित्रे. अशी चित्रे प्रामुख्याने मध्य प्रदेशातील भीमबेटका, पंचमढी, मोदी, कावडी तसेच महाराष्ट्रातील अमरावती इत्यादी ठिकाणी आढळली आहेत. दुसरा प्रकार म्हणजे कमी उठावाची कोरीव (उत्कीर्णन) चित्रशिल्पे. या प्रकारची चित्रशिल्पे केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एडक्कल येथील गुंफांमध्ये आढळली आहेत. १८९० मध्ये मलबारमधील पोलीस सुपरिंटेन्डेंट फ्रेड फॅसेट यांना शिकारी करता या भागात फिरताना या गुंफा दिसल्या. या गुंफांचा काळ नवाश्मयुग मानला जातो. एडक्कल या शब्दाचा अर्थ ‘दगडामध्ये’ असा आहे. या एका गुंफेचे दोन उपभाग पडले आहेत. डाव्या हाताच्या भिंतीवर मानवाकृती, हत्ती, जंगली कुत्रे, मोर व फुले व झाड यांचे चित्रण दिसते, तर उजव्या बाजूच्या भिंतीवर भौमितिक चिन्हे, काही शिकारीची दृश्ये दिसतात. या चित्रशिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे ही चित्रशिल्पे त्रिमितीचे दृश्य निर्माण करतात. अशी कोरीव चित्रे काही वेळा नदीकाठच्या कातळावर देखील आढळतात. गोव्यातील कुशावती नदीच्या काठी ऊसगाळमाळावयली (ऊसगळीमळ) येथे अशा प्रकारची कातळशिल्पे १९९३ साली पुरातत्त्वज्ञांना आढळून आली आहेत.
ऊसगळीमळ, गोवा येथील कातळशिल्प
रंगीत गुंफाचित्रांच्या बाबतीत मध्य प्रदेशातील भोपाळच्या दक्षिणेस ४५ किमी.वर विंध्य पर्वतरांगेतील भीमबेटका व त्याच्या आजूबाजूच्या भागातील चित्रांचे संशोधन महत्त्वपूर्ण मानले जाते. ‘भीमबेटका’ या शब्दाचा अर्थ तेथील आदिवासी भीमाचे आसन असा सांगतात. या गुंफा मध्य अश्मयुगकालीन असल्याचे पुरावे सापडले असले तरी त्यांचा वापर शुंग व गुप्त काळापर्यंत केला गेला असावा. येथील सु. १० चौ. किमी. परिसरात आठशे प्रस्तर गुहा असून त्यांपैकी पाचशे प्रस्तरालयांत चित्रे काढलेली आहेत. या प्रस्तर गुहांचे समन्वेषण पुरातत्त्वज्ञ वि. श्री. वाकणकर यांनी १९५५ मध्ये प्रथम केले; तथापि तेथे विस्तृत प्रमाणावर उत्खनन होईपर्यंत या गुहांकडे विद्वानांचे फारसे लक्ष गेले नाही. पुढे वाकणकर व व्ही. एन. मिश्र व सहकाऱ्यांनी उत्खनन केले. त्यात अश्मयुगीन उपकरणांपासून मध्याश्मयुगापर्यंतच्या काळातील विविध अवशेष उपलब्ध झाले. त्यामुळे तेथील चित्रवीथिकांच्या संशोधनास चालना मिळाली आणि विद्वानांचे लक्ष या प्रागैतिहासिक चित्रांकडे गेले. त्यांत मानवी उपकरणांची उत्क्रांती ज्ञात झाली; शिवाय उत्तर पुराणाश्मयुगीन मानवाच्या कवटीचा एक भागही मिळाला. तसेच शैलाश्रयी चित्रकलेचे भांडार आढळले. यांतील चित्रे एकाच काळातील नसून ती भिन्न कालखंडातील आहेत. त्यांतील अतिप्राचीन चित्रांचा काळ परस्पर उपलेपन पद्धतीच्या आधारे उत्तर पुराश्मयुग व मध्याश्मयुग असा गृहीत धरण्यात आला आहे. चित्रशैली, तंत्र व अध्यारोपन (सुपर इंपोझिशन) या आधारांवर वाकणकर यांनी या चित्रांचे सात कालखंड कल्पिलेले आहेत : (१) उत्तर पुराश्मयुग (२५००–१५००० इ.स.पू.), (२) मध्याश्मयुग (१५०००–६००० इ.स.पू.), (३) ताम्रपाषाणयुग (६०००–३००० इ.स.पू.), (४) नवाश्मयुग (३०००–२५०० इ.स.पू.), (५) आद्य ऐतिहासिक काळ (२५००–१८०० इ.स.पू.), (६) मध्य ऐतिहासिक काळ (१८००–९०० इ.स.पू.) आणि उत्तर ऐतिहासिक काळ (९००–५०० इ. स. पू.). येथील चित्रांचे विषय विविध आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्था त्यांत आढळतात. त्यामुळे तत्कालीन मानवाच्या जीवनपद्धतीची माहिती मिळते. चित्रवीथीत रानगवे, बैल, हत्ती, वाघ, हरिण, डुक्कर, गेंडा, नीलगाय, मोर, सांबर असे प्राणी असून क्वचित काही ठिकाणी पक्षीही चितारले आहेत. शिकारीचे अनेक प्रसंग आहेत. काहीची पुनरुक्ती आढळते. ही मानवांची गणचिन्हे असावीत, असे वाकणकर म्हणतात. दुसऱ्या एका चित्रात चार बालकांना जमिनीत पुरून त्यांच्या शवाभोवती एक पुरुष लाकडी कुंपण लावीत आहे व जवळच दोन महिला विलाप करीत आहेत असे चित्र काढले आहे. काही चित्रांत स्त्री-पुरुष दोघेही आहेत. शिकारीच्या चित्रात व्यक्तिगत वा सामूहिक प्रयत्न दाखविले आहेत. शिकारीच्या वा नृत्याच्या वेळी मुखवटे धारण करण्याची प्रथा असावी. मुखवटे व शिरीभूषणे कलाकुसरयुक्त असत. पाठीला टोपली वा गाठोडी बांधून अन्नसंकलनासाठी भटकणाऱ्या स्त्रियांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याशिवाय युगुले, मातृकादेवी, सुफलता व प्रजनन यांची प्रतीकात्मक चित्रे, गर्भवती संततीपालक स्त्रिया यांची चित्रे बरीच आहेत. तीन-चार चित्रे कामक्रीडेविषयीची आहेत. स्त्री-प्रतिमानात बहुविध अलंकारांचे दर्शन घडते. येथील प्राण्यांचे चित्रण वास्तववादी असून मानवी आकृत्या एका विशिष्ट शैलीत चितारल्या आहेत. चित्रे एकरंगी, दुरंगी व बहुरंगी असून पिवळा, लाल, तपकिरी व काळा या रंगांचा सर्रास वापर आढळतो. चित्रे काढण्यासाठी विविध प्रकारचे नैसर्गिक खनिज रंग वापरले गेले होते. हिरव्या रंगासाठी टेरा व्हेर्तासारखे (Terra verta) मृद्खनिज वापरले गेले. सर्वांत जुनी चित्रे हिरव्या रंगाची आहेत. तर मँगेनीज हे जांभळट रंगासाठी वापरले गेले. काही चित्रे चुनखडीपासून मिळणाऱ्या पांढऱ्या रंगांनी रंगवलेली आहेत. तर काही चित्रे रंगवताना गैरिक (Hematite) या दगडापासून मिळणाऱ्या लाल रंगाचा व त्याच्या पिवळ्या, नारंगी, तपकिरी छटांचा वापर करण्यात आला आहे. बहुतांश चित्रे लाल रंग व त्याच्या छटांची आहेत. चित्रे रंगवण्यासाठी तागाच्या झाडाच्या काठीचा उपयोग केला गेला असावा. या दीर्घ कालखंडावरील संशोधनादरम्यान वाकणकर यांना विविध काळातील जवळपास वीस शैली सापडल्या. गुहांत काही लघु-अश्मास्त्रे सापडली असल्यामुळे मध्याश्मयुगीन मानव या गुहांत वसती करून राहत असावा. येथे एकूण १६ शैलाश्रयात (रॉक शेल्टर) चार विद्यापीठांनी केलेल्या उत्खननांत तेरा मानवी सांगाडे मिळाले. त्यांतील एक सांगाडा भारतातील मानवी अवशेषांतील सर्वांत प्राचीन असावा, असा पुरातत्त्ववेत्त्यांचा कयास आहे; कारण याच्या गळ्यात शहामृगाच्या अंड्याचे मणी आहेत.
खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध · इये मराठीचिये नगरी
टीम इये मराठीचिये नगरी
8–10 minutes
खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध
June 6, 2022June 6, 202204102
खोटले धनगरवाडी सड्यावर ३५हून अधिक कातळशिल्पांचा शोध
‘लज्जागौरी’सदृश शिल्पाचे अस्तित्व: हा प्राचीन वारसा चिरेखाणींच्या विळख्यात : सतीश लळीत
खोटले धनगरवाडी परिसरात ३५ हून अधिक कातळशिल्पे
मानवाकृती, प्राणी, मासे, अमूर्त आकृत्यांचा समावेश
‘लज्जागौरी’सदृश शिल्प आश्चर्यकारक
कातळशिल्पे या आदिमानवाच्या पाऊलखुणा
चिरेखाणींपासुन कातळशिल्पांना धोका
काही कातळशिल्पे खाणींमध्ये नष्ट
वेळीच दक्षता न घेतल्यास प्राचीन वारसा नष्ट होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले ‘लज्जागौरी’सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे. मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.
आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मी गेली २१ वर्षे जिल्ह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहे. अलिकडेच माझे ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. नवीन कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असताना खोटले येथील माळरानावर ‘वेताळा’चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाल्यावर मी व डॉ. सौ. सई लळीत अशा दोघांनी या परिसरात मोहिम आखली. या परिसरात राहणारे श्री. लक्ष्मण बाबु जंगले यांच्या मदतीने शोध घेतला असता खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली. वास्तविक हे एक कातळशिल्प असुन येथील लोकमानस त्याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखते. यासंदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत. या ‘वेताळा’ला नवसही बोलले जातात, अशी माहिती मिळाली.
‘वेताळा’चे हे कातळशिल्प पाहिल्यावर या परिसरात आणखी काही अशाच प्रकारची कातळशिल्पे असण्याची दाट शक्यता होती. तशी विचारणा करता काही ठिकाणी ‘पांडवांची चित्रे’ आहेत. लहानपणी आम्ही ती पाहिली आहेत. मात्र ती शोधावी लागतील, असे श्री. जंगले यांनी सांगितले. ते आणि याच परिसरातील दुसरे रहिवासी नारायण रामा मोडक यांच्या मदतीने सड्यावर शोध घेतला असता ठिकठिकाणी ३५ हून अधिक कातळशिल्पे आढळून आली. या सर्व शिल्पांमध्ये भरलेली माती काढून त्यांची स्वच्छता करुन मोजमापे घेण्यात आली.
या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला ‘वेताळ’ म्हणुन ओळखतात. अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे. येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळशिल्पे आढळून येतात. आमच्यासोबत असणाऱ्या स्थानिकांनीही ती प्रथमच पाहिली. या सर्व कातळशिल्पांमधील माती, गवत काढल्यानंतर ती स्पष्ट दिसु लागली. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत, अशी माहिती श्री. लळीत यांनी दिली.
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
*’लज्जागौरी’सदृश शिल्प आश्चर्यकारक*
खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे ‘लज्जागौरी’ किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता, असे मानले जाते. त्याकाळी ही संकल्पना रुजली असावी, असे एक मत आहे. शिवाय, स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पत्तीच्या शक्तीमुळे तिला हे सन्मानाचे स्थान दिले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. सिंधु संस्कृतीशी संबंधित उत्खननात लज्जागौरीच्या काही प्रतिमा सापडल्या आहेत. अनेक आदिवासी समुह या देवीची पूजा करतात. भारतात मध्य भारत, दख्खन, कर्नाटक, आंध्र भागात लज्जागौरीच्या मूर्ती, प्रतिमा सापडल्या आहेत. अमरावती येथे सापडलेली लज्जागौरीची संगमरवरी मूर्ती (सद्या चेन्नई वस्तुसंग्रहालयात आहे.) ही सातवाहन काळातील इ.स. १५० ते ३०० यादरम्यान कोरली असावी, असे तज्ञांचे मत आहे. इसवी सनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान बदामी चालुक्य राजवंशाच्या काळातील अशा काही मूर्ती सापडल्या आहेत. लज्जागौरी ही देवता शिरविरहीत असते. डोक्याऐवजी कमळाचे फुल असते. ही देवी सुफलनाचे प्रतीक असल्याने ती जननस्थितीमध्ये दाखवली जाते. (Lotus headed Goddess in birthing posture) खोटले येथील हे कातळशिल्प आधुनिक काळातील लज्जागौरीशी विलक्षण साम्य दर्शवते. कदाचित आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे, असे मत श्री. सतीश लळीत यांनी व्यक्त केले आहे.
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
या सर्व परिसरात चिरेखाणींचे साम्राज्य पसरले आहे. या खाणींमध्ये कितीतरी ‘पांडवांची चित्रे’ नष्ट झाली असे स्थानिकांनी सांगितले. याचठिकाणी असणाऱ्या सुमारे २० फुट लांब व २० फुट रुंद कातळशिल्पावर चिरेखाणीतील खराब तुटके चिरे व माती टाकून दिल्याने ते अत्यंत महत्वपूर्ण कातळशिल्प मातीखाली गेले, असे स्थानिकांनी सांगितले. या चिरेखाणी अशाच अनिर्बंधपणे सुरु राहिल्यास भविष्यात यापैकी अनेक कातळशिल्पे काळाच्या उदरात गडप होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने व महसुल खात्याने याची दखल घेऊन या परिसरात चिरेखाणींची परवानगी देताना खाणचालकांना कातळशिल्पांचे जतन करण्याची अट घालूनच परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. लळीत यांनी केली आहे.
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
Katalshilp discovery in Khotale sindhudurg District by Satish Lalit
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी. या काळात मानव हा भटका शिकारी अवस्थेत होता. त्याला पशुपालन व शेतीचे ज्ञान नव्हते. कातळशिल्पे म्हणजे नेमके काय, त्यांचा कालावधी, ती कोरण्याचे उद्देश याबाबत आपण ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ या ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासुंनी तो अवश्य वाचावा. अलिकडेच राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाने केंद्र सरकारमार्फत कातळशिल्पांना ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणुन मान्यता मिळावी असा प्रस्ताव ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेकडे पाठवला होता. तो प्राथमिक स्वरुपात स्वीकारुन त्यांचा समावेश तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. यामघ्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्यादृष्टीनेही भुषणावह आहे, असे श्री. लळीत यांनी सांगितले.
रहस्यमयी’ देवाचे गोठणे अन् बारसूमध्ये असे आहे तरी काय? ज्याची चर्चा होतेय! (Video)
स्वालिया न. शिकलगार
6–7 minutes
पुढारी ऑनलाईन डेस्क : बारसूमधील कातळशिल्पांना राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा, अशी मागणी होत आहेच. किंबहुना, कोकणातील अनेक कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थान मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुळात बारसू (ता. राजापूर) हे कातळशिल्प राज्य सरकारने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहेच. सोबतच सिंधुदुर्गातील कुडोपी, रत्नागिरीतील उक्षी, जांभरुण, कशेळी, बारसू, देवाचे गोठणे, निवळी, चवे देऊड, रुंधेतळी, देवी हासोळ अशी कातळशिल्पे आजदेखील अस्तित्वात आहे. ही दगडात कोरलेली शिल्पे मानवी उत्क्रांतीची साक्ष देतात. मासे, जलचर सृष्टी, प्राणी, माणसे आणि अनेक रहस्य़मयी कातळशिल्पे जी कल्पना करण्याच्या पलिकडे आहेत. काही कातळशिल्पे जांभ्या दगडांमध्ये कोरली गेलेली आहेत. कोकणातील ही कातळशिल्पे जवळपास ४५ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते. वरील कातळशिल्पांपैकी आज देवाचे गोठणे आणि बारसू येथील कातळशिल्पांबद्दल जाणून घेणार आहोत. देवाचे गोठणे येथील कातळशिल्पांना जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. येथे एक आश्चर्यजनक घटना घडते, ज्याचा अनुभव तुम्ही प्रत्यक्षात घेऊ शकता.
बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प
कोकणातील कातळशिल्पे प्रागैतिहासिक आणि मध्याश्मयुगीन मानवाने कोरलेल्या शिल्पाकृती असल्यामुळे या ठिकाणांना खूप महत्त्व आहे. बारसू आणि देवाचे गोठणे ही दोन्ही कातळशिल्पे मध्याश्मयुगीन काळातील आहेत. देवाचे गोठणे आणि बारसू ही दोन्ही ठिकाणे कुतुहल निर्माण करणारी आहेत. पैकी देवाचे गोठणे या ठिकाणी तुम्ही एकदा का होईना भेट द्यायलाचं हवी. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात १) बारसू आणि २) देवाचे गोठणे ही दोन गावे आहेत. या दोन्ही ठिकाणी कातळशिल्प आहेत. 'रहस्यमयी' देवाचे गोठणे कातळशिल्प विलक्षण अनुभव देणारे ठरेल.
बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प
बारसूची कातळशिल्पे कुतूहल निर्माण करणारी
बारसू हे गाव तसे छोटे पण नारळ, पोफळी, आंब्याच्या झाडांनी वेढलेले. काजूची अनेक मळे, हिरवागार निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट आणि नीरव शांतता अनुभवायला येते. कोल्हापूरपासून साडे तीन तासांचा प्रवास करत बारसूला पोहोचता येतं. जाताना बारसू नावाचे फलक दिसते. पण, त्या गावात न जाता, अलिकडेच डाव्या बाजूला कच्चा रस्ता गेला आहे. दोन किलोमीटर आतमध्ये हा रस्ता असून याठिकाणी चारचाकी आणि दुचाकीने कातळशिल्पांपर्यंत जाता येते. पण आजूबाजूला बऱ्याच किलोमीटर अंतरावर कोणत्याही सुविधा नसल्याने सोबतचं पाणी आणि खाऊ घेऊन जाणे सोयीचे ठरते.
बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प
बारसूच्या एका विस्तीर्ण पठारावर तीन ते चार ठिकाणी विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. जांभ्या दगडांवर प्राण्यांची चित्रे, वाघ, ससा, छोटे-मोठे मासे, मानवी आकृती, समुद्र असे अनेक शिल्पे आहेत. अशी काही शिल्पे आहेत, जी समजण्यापलिकडे आहेत. ही शिल्पे आकाराने मोठी आहेत. तर काही आकृत्या आकाराने छोट्या आहेत. त्यातील काही शिल्पांचा अर्थ किंवा त्या आकृत्या नेमक्या कशाचा आहेत? हे पटकन लक्षात येत नाहीत. कातळशिल्पांचा अभ्यास करणारे अनेक अभ्यासक, तज्ज्ञ, इतिहासकार यावर संशोधन करताना दिसतात.
बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प
बारसूला कसे जाल?
कोल्हापूरपासून बारसूला जाण्यासाठी साडेतीन तासांचा कालावधी लागतो.
बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प
कोल्हापूर-गगनबावडा-अणुस्कुरा घाट-पाचाल रोड-रायपाटण-मुंबई गोवा हायवे-हार्डी ब्रीज-बारसू कातळशिल्प (petroglyphs of barsu)
बारसूतील कातळशिल्प
बारसूतील कातळशिल्प
'गूढ' देवाचे गोठणे कातळशिल्पाचे
अविस्मरणीय ठिकाण म्हणजे देवाचे गोठणे. हे एक छोटं खेडेगाव. मातीची कोकणी कौलारू घरं, मातीने, शेणाने सारवलेले विस्तीर्ण अंगण, समोर तुळस, हंबरडणारी गुरे, आंबा, काजू, फणस, सुपारी, कोकम, पळस, फुले, माडाची झाडे आणि त्यातून येणार चिवचिवाट असा निसर्ग इथे अनुभवायला येतो. या गावातून पठारावर जाणारी एक छोटी वाट आहे.
तुम्ही जाणार असाल तर गावातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांना सोबत घेऊन या पठारावर जाऊ शकता. शक्यतो या लॅटेराईट पठारावर एकटे जाऊ नये. कारण भल्या मोठ्या पठारावर येथील कातळशिल्प शोधणे कठीण जाते.
देवाचे गोठणे
देवाचे गोठणे
गावातून पायवाट तुडवत अर्धा तासांच्या चढतीनंतर पठारावर पोहोचता येते. अंदाजे साडे सात ते ८ फूट माणसाची प्रतिमा येथे कोरलेली आहे. हे गूढ कातळशिल्पे पाहण्यासाठी हजारो पर्यटक, अभ्यासक याठिकाणी येतात. या मानवाच्या प्रतिमेवर विविध ठिकाणी होकायंत्र ठेवल्यानंतर उत्तर – दक्षिण अशी अशी दिशा स्थिर होत नाही. शिवाय होकायंत्र गोल गोल फिरत राहते. त्याचा व्हिडिओ लेखाच्या शेवटी दिलेला आहे.
file photo
file photo
या खडक चुंबकीय विसंगती दर्शवतो. या मानवाच्या पूर्ण प्रतिमेवरचं हे होकायंत्र काम करत नाही. मुळात चुंबकसूची (सुई) पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर-दक्षिण दिशेने स्थिर होते. पण या प्रतिमेवर होकायंत्राची सुई कधी सुलट तर कधी उलट आपोआप गोल फिरत राहते.
भार्गव राम मंदिर
भार्गव राम मंदिर
या गूढ ठिकाणाचा अभ्यास करण्यासाठी अनेक संशोधक, इतिहास तज्ज्ञ या ठिकाणी येत असतात. या मानवाची प्रतिमा असलेल्या कातळशिल्पावरचं होकायंत्र उत्तर-दक्षिण स्थिर होत नाही. पण, या आकृतीपासून होकायंत्र बाजूला नेताच पुन्हा होकायंत्राची सूई दिशा दर्शवते.
सोलगावातून देवाचे गोठणेला जाता येते
सोलगावातून देवाचे गोठणेला जाता येते
या मानवाच्या पायाजवळ तर होकायंत्राची सुई अजिबात दिशा दाखवत नाही.
देवाचे गोठणेकडे जाणारा पूल
देवाचे गोठणेकडे जाणारा पूल
'देवाचे गोठणे'ला कसे जाल?
देवाचे गोठणे हे बारसूपासून नजीक आहे. बारसूपासून अर्धा तासाचे अंतर कापल्यानंतर देवाचे गोठणे या ठिकाणी जाता येते. सोळगाव देवाचे गोठणेला जाताना डाव्या बाजूना फलक दिसतील. शिवाय सोळगाव देवाचे गोठणेच कमानदेखील दिसेल. तिथून आतमध्ये जाता येईल. शिवाय काही अंतर पार केल्यानंतर पुन्हा डाव्या बाजूला एक ब्रीज असून भार्गव राम मंदिर दिसेल, त्या ठिकाणी गाडी पार्क करता येईल.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे
ऑनलाइन लोकमत
4–5 minutes
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर घालणारी आणखी ३५ हून अधिक कातळशिल्पे उजेडात आली आहेत. कसालपासुन अवघ्या दहा किलोमीटरवरील खोटले (ता. मालवण) गावच्या धनगरवाडी सड्यावर आढळलेल्या या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी'सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे.
मात्र या सर्व कातळशिल्पांचे अस्तित्व या परिसरातील चिरेखाणींमुळे धोक्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून अनेक कातळशिल्पे चिरेखाणींमध्ये नष्टही झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती या कातळशिल्पांचा शोध लावणारे अभ्यासक व 'घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग' संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी दिली.
आपल्या या नव्या शोधाबाबत माहिती देताना श्री. लळीत म्हणाले की, मी गेली २१ वर्षे जिल्ह्यातील कातळशिल्पांचे संशोधन व अभ्यास करीत आहे. अलिकडेच माझे 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. नवीन कातळशिल्पे शोधण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु असताना खोटले येथील माळरानावर 'वेताळा'चे चित्र कोरलेले आहे, अशी माहिती मिळाल्यावर मी व डॉ. सौ. सई लळीत अशा दोघांनी या परिसरात मोहिम आखली.
या परिसरात राहणारे लक्ष्मण बाबु जंगले यांच्या मदतीने शोध घेतला असता खोटले आणि पोईपच्या सीमेवर एका टेकडीच्या उतारावरील झाडाझुडपांमध्ये जांभ्या दगडात कोरलेली मानवाकृती निदर्शनास आली. वास्तविक हे एक कातळशिल्प असुन येथील लोकमानस त्याला 'वेताळ' म्हणुन ओळखते. यासंदर्भात काही लोककथाही या भागात प्रचलित आहेत. या 'वेताळा'ला नवसही बोलले जातात, अशी माहिती मिळाली.
या कातळशिल्पांमध्ये सहा मनुष्याकृती, तीन चतुष्पाद प्राणी, दोन मासे, गोलाकृती व अन्य १२ अमूर्त शिल्पे, एक शिल्पपट्ट किंवा मांड याचा समावेश आहे. यापैकी काही कातळशिल्पे झिजलेली असून काही अतिशय सुस्थितीमध्ये आहेत. अगदी सुरुवातीलाच २० फुट व्यासाचे एक वर्तुळाकृती कातळशिल्प नजरेला पडते. येथून अवघ्या काही फुटांवर एक मोठी चिरेखाण आहे. या ठिकाणाहून सुमारे अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर टेकडीच्या उतारावर झाडाझुडपांमध्ये एक सुस्पष्ट मानवाकृती दिसते. तिच्या शिराकडच्या बाजुला दगडांचा मोठा ढिग आहे. स्थानिक रहिवासी याला 'वेताळ' म्हणुन ओळखतात.
अशीच मानवाकृती हिवाळे, कुडोपी येथेही आढळली आहे. याचठिकाणी एक गुहासुद्धा आढळली. मात्र आता ती मातीने भरली आहे. येथून आणखी सुमारे एक किलोमीटर परिसरात एका छोट्याशा टेकडीवर एकाच ठिकाणी विविध प्रकारची ३० कातळशिल्पे आढळून येतात. आमच्यासोबत असणाऱ्या स्थानिकांनीही ती प्रथमच पाहिली. या सर्व कातळशिल्पांमधील माती, गवत काढल्यानंतर ती स्पष्ट दिसु लागली. याठिकाणी वाघासारख्या प्राण्याची दोन चित्रे अतिशय महत्वपूर्ण आहेत, अशी माहिती लळीत यांनी दिली.
0
Powered by:PS
घटना महाराष्ट्रासाठी भूषणावह
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जांभ्या दगडाच्या सडेपठारांवर आढळणारी ही कातळशिल्पे म्हणजे आदिमानवाच्या या परिसरातील वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. या कातळशिल्पांची निर्मिती मध्याश्मयुग ते नवाश्मयुग (इसवीसनपूर्व २० ते १० हजार वर्षे) या काळात झाली असावी. अलिकडेच राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाने केंद्र सरकारमार्फत कातळशिल्पांना 'जागतिक वारसा स्थळ' म्हणुन मान्यता मिळावी असा प्रस्ताव 'युनेस्को' या जागतिक संस्थेकडे पाठवला होता. तो प्राथमिक स्वरुपात स्वीकारुन त्यांचा समावेश तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. यामघ्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. ही घटना केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्यादृष्टीनेही भुषणावह आहे, असे लळीत यांनी सांगितले.
आमच्या न्यूजलेटरसाठी साईन-अप करा
'लज्जागौरी'सदृश शिल्प आश्चर्यकारक
खोटले येथे आढळलेल्या एका कातळशिल्पाचे 'लज्जागौरी' किंवा मातृदेवतेच्या मुर्तीशी विलक्षण साम्य आहे. हे शिल्प आश्चर्यकारक आहे. लज्जागौरी ही सुफलनाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. जगभरात एक काळ मातृसत्ताक पद्धतीचा होता, असे मानले जाते. त्याकाळी ही संकल्पना रुजली असावी, असे एक मत आहे. शिवाय, स्त्रीच्या ठिकाणी असलेल्या उत्पतीच्या शक्तीमुळे सन्मानाचे स्थान दिले असावे.
royalbhatka.com
निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प
Royal bhatka
6–7 minutes
निवळी गावातील बारव आणि कातळशिल्प
भारतात ब्रिटीश राजवट येऊन स्थिरावण्यापूर्वी शतकानुशतके आपल्या ज्ञानातून आणि परंपरेतून भारतीय समाज जलविज्ञानाचा वापर दैनंदिन गरजांसाठी करीत होते. त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी फाट्याजवळ रस्त्यालगतच जांभ्या कातळात खोदलेली ही बारव ! प्राचीन काळापासूनच सिंचन आणि पिण्यासाठी, पाण्याचा साठा वर्षभर रहावा यासाठी काटेकोर व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी अशा विहिरींच्या माध्यमातून केलेली दिसते. जांभ्या खडकात खोलवर खोदलेल्या विहिरी भर उन्हाळ्यात सुद्धा थंड पाण्याचा आनंद देतात. साधारणतः ४० ते ५० पायऱ्यांची ही नंदा बारव (एकाच बाजूने विहिरीत उतरण्याचा मार्ग असलेली) प्रकारातील बारव आहे. कोकणात अशा प्रकारच्या विहिरींना घोडबाव सुद्धा म्हटले जाते. विहिरीच्या बाहेरील बाजूस दोन फूट लांब आणि दीड फूट रुंद दगडी भांडे पाहायला मिळते.
जयगड आणि रत्नागिरी यांसारख्या प्राचीन बंदरांमधून जाणाऱ्या मार्गावर वाटसरू आणि व्यापारी या दोन्हीसाठी ही विहीर म्हणजे एक वरदान असणार यात काही शंकाच नाही. पावसाळयात तुडुंब भरलेली निळ्याशार पाण्याची विहीर बघताच क्षणी मनाला भुरळ पाडते. निवळी फाट्यापासून ७५० मीटर अंतरावर असलेली विहीर आजूबाजूला नव्याने बांधलेल्या हॉटेल आणि रिसॉर्टमधूनही आपलं अस्तित्व टिकवून आहे.
विहिरीच्या समोरच रस्त्यापालिकडे एक १५ फूट × १५ फूट आकाराचे कातळचित्र / कातळशिल्प कोरलेले आहे. ह्याच ठिकाणामुळे सर्वप्रथम कातळचित्र ही गोष्ट लोकांसमोर आली. १९८० च्या दरम्यान नवीन रस्त्याचे काम चालू असताना कातळात खोदलेला चित्रांचा एक संच लोकांच्या नजरेस पडला. कोकणात सापडलेली ही कातळचित्रांची पहिली जागा. त्याचा बराचसा भाग हा आज रस्त्याखाली गाडला गेला आहे. उर्वरित भागांतील चित्रांमध्ये भौमितिक आकार, उभ्या-आडव्या रेघा आणि अनेक वक्राकार रेषा बघायला मिळतील. 'कोकणातील पर्यटन' या पुस्तकात प्र. के.घाणेकर यांनी निवळी गावातील कातळशिल्प या विषयावर प्रकाश टाकला. श्री.रवींद्र लाड यांचे 'कोकणातील कातळशिल्पे आणि सिंधू संस्कृती' आणि श्री. सतीश लळीत यांचे 'सिंधुदुर्गातील कातळशिल्पे' ही कातळशिल्पांवर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उभ्या भिंतीवर कोरलेल्या चित्रांना Petroglyps म्हणतात. 'पेट्रा' म्हणजे दगड आणि 'ग्लिफिन' म्हणजे कोरीवकाम. आडव्या भिंतीवर / दगडावर कोरलेल्या आकृत्यांना किंवा चित्रांना geoglyps संबोधले गेले. ह्या चित्रांची काळनिश्चिती जरी झाली नसली तरी, ह्या आकृत्या कोणी व का कोरल्या असतील हे अजूनही एक गूढच आहे. जगात इतरत्र आढळणाऱ्या कातळचित्रांपेक्षा कोकणातील कातळचित्रे खूपच वेगळी आहेत. रत्नागिरीच्या निसर्गयात्री संस्थेने कोकणात एकूण ४० पेक्षा जास्त गावांतून १५०० पेक्षा जास्त चित्रे उजेडात आणली. युनेस्कोच्या यादीत कोकणातील कशेळी, रुंध्येतळी, देवाचे गोठणे, बारसू, देवी हसोळ, जांभरूण, कुडोपी, उक्षी आणि गोव्यातील पानसायमोल अश्या ९ ठिकाणची चित्रे समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे जगभरातल्या अभ्यासकांची पावलं नक्कीच इकडे वळतील. ह्या चित्रांच्या माध्यमातून व्यक्त होणारा मानव हा फारच कलात्मक आणि कल्पक बुद्धीचा असणार हे मात्र नक्की!!!
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात (1990) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात निवळी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जांभ्या दगडाच्या सड्यावर/कातळावर 'कातळशिल्प' नावाची कोरलेली चित्रे दिसून आली आणि कोकणातील इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. ही चित्रे म्हणजेच अश्मयुगीन मानवी वावराच्या पाऊलखुणाच आहेत.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात (1990) कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात निवळी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना जांभ्या दगडाच्या सड्यावर/कातळावर 'कातळशिल्प' नावाची कोरलेली चित्रे दिसून आली आणि कोकणातील इतिहासाला नवी कलाटणी मिळाली. ही चित्रे म्हणजेच अश्मयुगीन मानवी वावराच्या पाऊलखुणाच आहेत.
कातळशिल्प म्हणजे नक्की काय? तर याला इंग्रजीमध्ये 'पेट्रोग्लिफ्स' असे म्हणतात. हा मूळ ग्रीक भाषेतील शब्द. 'पेट्रा' म्हणजे दगड आणि 'ग्लिफिन' म्हणजे कोरीव काम. म्हणून याला 'पेट्रोग्लिफ्स' अशी संज्ञा प्राप्त झाली.
अश्मयुगातील मानवाने तयार केलेली गुहाचित्रे (शैलचित्रे), प्रस्तरचित्रे ही उभ्या दगडांवर/भिंतींवर असतात. तर आडव्या भूपृष्ठावर असणाऱ्या चित्रांना/आकृत्यांना 'जिओगलिप्स' असे संबोधतात. काही रेषांची चित्रे असतात त्यांना 'अर्थ लाइन्स' (पेरू देशातील नाझ्का लाइन्स) असे म्हणतात.
या प्रकारची चित्रे जगभरात आढळली आहेत. परंतु, कोकणातील कातळशिल्पे आपले वेगळे अस्तित्व दाखवतात. अश्मयुगातील किंवा प्रागैतिहासिक काळातील मानवाने या आकृत्या नक्की कोणत्या कालखंडात कोरल्या असाव्या त्याची निश्चिती अद्यापही झालेली नाही.
07
तसेच या आकृत्या कोरण्यामागे काय कारण होते, त्या कशासाठी कोरल्या, कशा पद्धतीने कोरल्या, इत्यादी अनेक प्रश्न आजच्या तारखेला अज्ञात आहेत.
तसेच या आकृत्या कोरण्यामागे काय कारण होते, त्या कशासाठी कोरल्या, कशा पद्धतीने कोरल्या, इत्यादी अनेक प्रश्न आजच्या तारखेला अज्ञात आहेत.
08
कोकणातील कातळशिल्पांमध्ये प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी आकृत्या प्रामुख्याने चित्रित केल्या आहेत. त्यामुळे शिकारी आणि मासेमारी करून उपजीविका करण्याच्या काळातील ही कला असावी, असा कयास करता येतो.
कोकणातील कातळशिल्पांमध्ये प्राणी, पक्षी, मासे, इत्यादी आकृत्या प्रामुख्याने चित्रित केल्या आहेत. त्यामुळे शिकारी आणि मासेमारी करून उपजीविका करण्याच्या काळातील ही कला असावी, असा कयास करता येतो.
09
कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास 170 किमी लांब आणि 25 किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत. पुढे गोवा आणि कर्नाटकामध्येही कातळशिल्पे आहेत.
कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास 170 किमी लांब आणि 25 किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत. पुढे गोवा आणि कर्नाटकामध्येही कातळशिल्पे आहेत.
कातळशिल्प
फोटो स्रोत, SHARAD BADHE
भारतविद्या आणि कलाइतिहास अभ्यासक सायली पलांडे-दातार सांगतात, "जेव्हा आपण पुरातत्वशास्त्राच्या अंगानं बघतो तेव्हा आपल्याकडे उत्खननं केली जातात. त्यात आपण खोल खाली जाऊन सांस्कृतिक क्रम आहे तो शोधतो. इथे सडा आहे सगळीकडे. माती कुठेच नाही की जिच्यात मानवी अस्तित्वाच्या खुणा मिळतील. थोडीफार हत्यारं मिळाली आहेत, पण उत्खननात जे अन्डिस्टर्ब्ड लेयर्स मिळाल्या पाहिजेत, तसं इथे मिळत नाही. किमान शिल्पांच्या आसपास मिळत नाही. म्हणून आपल्याला इतर प्रकारच्या गोष्टी वापरायला लागत आहेत. त्यासाठी मी आर्ट हिस्टॉरिक मेथड्स वापरायचा प्रयत्न करते आहे.
ज्या चित्रपाशी आता आपण उभे आहोत त्याकडे बघतांना आपल्याला वाघासारखे दोन मोठे महाकाय प्राणी दिसतात आणि मधे तुम्हाला एक मानवी आकृती दिसते. त्यात जी सिमेट्री आहे ती त्यांनी विलक्षण साधलेली आहे. हे करणं जिकीरीचं काम आहे. त्यांनी आऊटलाईनवरुन तो एक उठाव दिलेला आहे. एम्बॉस केलेला आहे. आत वेगवेगळे भौमितिक आकार दिसतात. जो मूळचा वाघ आहे त्यामध्ये वेगळेपण आणण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यात माणसांचं आणि पशूंचा एक संबंध आपल्याला दिसतो आहे"
सायली पलांडे-दातार
फोटो स्रोत, SHARAD BADHE
फोटो कॅप्शन, सायली पलांडे-दातार
कोकणाच्या संपन्न समुद्रकिनाऱ्यावर कायम काहीतरी समृद्ध करणारं मिळालं आहे. अगदी नारळ-पोफळी-आंब्याच्या बागांपासून ते मराठी साहित्य समृद्ध करणा-या साहित्यिकांपर्यंत. आता ही कातळशिल्पं मानवी संस्कृतीच्या आतापर्यंत झालेल्या अभ्यासाला समृद्ध करणार आहेत.
कातळशिल्प
फोटो स्रोत, SHARAD BADHE
कातळशिल्पं तयार करणारा माणूस कुठे राहायचा असा प्रश्न आल्यावर त्याकाळचा मानव गुहेत राहात असावा असा समज असतो. त्यामुळे या परिसरात कुठे गुहा आहेत का याचा शोध सुरू झाला. तो राहाण्याची ठिकाणं शोधली जाऊ लागली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळोशी येथे अशा प्रकारच्या गुहेचा शोध घेण्यात आला. शिल्पं कोरण्यासाठी या मानवानं कातळाची का निवड केली? त्यातून त्याला काय सांगायचं आहे याचा शोध घेणं सुरू आहे.
कातळशिल्प
फोटो स्रोत, SHARAD BADHE
केळोशी येथील या गुहेत आदिम काळातली हजारो हत्यारं सापडली आहेत. त्यासाठी वापरलेले दगड जवळपासच्या नदीपात्रातूनच आणली असावीत असा अंदाज आहे. त्या काळात माणूस याच गुहांमध्ये बसून हत्यारं बनवत असावा असं तज्ज्ञांना वाटतं.
ऋत्विज आपटे
फोटो स्रोत, SHARAD BADHE
फोटो कॅप्शन, ऋत्विज आपटे
पुरातत्व अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी आम्हाला याबाबत अधिक माहिती दिली.
ते म्हणाले, "दोन ठिकाणी आम्ही ट्रेन्चेस घेतल्या होत्या. त्या ट्रेन्चेसमध्येच आम्हाला खूप सारी दगडी हत्यारं मिळाली. जवळपास हजाराच्या संख्येनं दगडी हत्यारं मिळाली. त्यानंतर हे मटेरियल कुठनं आणलं असेल याचा आम्ही शोध सुरु केला. हे कोकणात मिळणारं मटेरियल नाही किंवा सिंधुदुर्गात मिळणारं मटेरियल नव्हतं. कुठं मिळतं ते? तर जिथे वॉटर बॉडी आहे, नाला आहे, नदी आहे अशा ठिकाणी मिळतात. त्याचा आम्ही शोध घेतला. दोन दोन किलोमीटर नदीपात्रातच मिळाला. तो आम्हाला असा अंदाज आला की हा माणूस तिकडनं दगडं उचलून या गुहेत आणायचा आणि गुहेत बसून तो दगडी हत्यारं बनवत होता. त्यामुळं याला पुष्टी मिळाली की ही हैबिटेशनल साईट होती. इथं माणूस राहिला होता बरीच वर्षं. आणि इथं बसून तो हत्यारं बनवत होता."
कातळशिल्प
फोटो स्रोत, SHARAD BADHE
कोकणातल्या काही कातळशिल्पांजवळ चुंबकीय क्षेत्रातही काही बदल होत असावेत असं जाणवतं. होकायंत्रातली चुंबकीय सुची विचलित होत असल्याचं दिसतं.
कातळशिल्प
फोटो स्रोत, SHARAD BADHE
esakal.com
कोकणात जांभ्या सड्यावर आढळली तब्बल 10 हजार वर्ष जुनी कातळशिल्पं; कुतूहल वाढवणाऱ्या प्रतिमांनी वेधलं लक्ष
सकाळ डिजिटल टीम
2–3 minutes
Updated on:
09 March 2024, 12:35 pm IST
कोकणात विविध भागात सुमारे 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत. पण, तशीच कातळशिल्प दापोली आणि मंडणगडमध्येही आढळली असल्याने त्याबद्दल कुतूहल अधिक वाढलंय.
Katalshilp Found in Dapoli Mandangad : बारसू (ता. राजापूर) आणि चवे (ता. रत्नागिरी) येथील कातळ खोदचित्रांना (Katal Shilp Konkan) राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं आहे. त्यानंतर आता दक्षिण रत्नागिरीत (South Ratnagiri) राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळू लागली आहेत. रत्नागिरीच्या (Ratnagiri) दापोलीमधील उबर्ले गावात काही कातळशिल्प (Katalshilp) आढळली आहेत.
या कातळ शिल्पांवर एलियन सदृश्य प्रतिमा असल्यामुळं अनेकांचं कुतूहलही वाढलंय. अभ्यासकांच्या दाव्यांनुसार, ही कातळशिल्प सुमारे 10 हजार वर्षांपूर्वीची आहेत. अशाप्रकारची कातळशिल्प आसपास अन्यत्र कुठेही नसल्याचं त्यांनी सांगितलंय. 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबर्ले गावामध्ये ही कातळशिल्प जांभ्या सड्यावर आढळली आहेत.
यामध्ये 6 कातळशिल्पांचा देखील समावेश आहे. मानवासह तीन हरीण आणि 2 बैल देखील आढळली आहेत. सातपैकी एक कातळशिल्प सुमारे 17 फीट लांबीचं आहे. तर, मंडणगडमधील (Mandangad) बोरखत गावामध्येही एक कातळशिल्प आढळलंय. कोकणात यापूर्वी राजापूर, रत्नागिरी, लांजा या पट्ट्यात कातळशिल्प आढळली आहेत.
कोकणात 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प
कोकणात विविध भागात सुमारे 1500 पेक्षा अधिक कातळशिल्प आहेत. पण, तशीच कातळशिल्प दापोली आणि मंडणगडमध्येही आढळली असल्याने त्याबद्दल कुतूहल अधिक वाढलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. अजय धनावडे दापोलीत सापडलेल्या कातळशिल्पांच्या या ठिकाणी भेट देत आहे. सध्या त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. कोकणातील कातळशिल्पं ही अश्मयुगीन काळातील असून सुमारे 10 ते 3 हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता मानली जात आहे.
कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’
*_- मेहरून नाकाडे रत्नागिरी : ऐतिहासिक काळातील सांंस्कृतिक संंदर्भ म्हणून कातळशिल्पांंचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. मात्र, ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. सर्वाधिक कातळशिल्पे ही रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात शिल्परचना सापडल्या आहेत._*
*_🖊 विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्पकिंवा चित्रांना ‘रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स किंवा कातळशिल्प’ या नावाने ओळखले जाते. रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेली ही कातळशिल्प नजरेस पडल्यानंतर त्याबाबतचे कुतूहल अधिक वाढले. ही कातळशिल्प पाहण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.प्रामुख्याने कातळ सड्यांवर कातळशिल्प शोधमोहीम सुरु आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा येथील समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व दिशेला २५ किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरात ३७०० चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील कातळ खोदशिल्पाचे संशोधनकार्य सुरु आहे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील ही कातळशिल्पे असून, सुधीररिसबूड, प्रा. सुरेंंद्र ठाकुरदेसाई, धनंंजय मराठे यांची हीशोधमोहीम गेली काही वर्षे सुरू आहे. कातळशिल्पांंच्या संंरक्षणासाठी शासना कडून प्रथमच निधी मंंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकºयांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून त्यांची नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.सुंदर कातळशिल्पे संरक्षित करण्यासाठी अधिनियम करुन पुरातत्वविभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन आयुक्त जगदीश पाटील यांनी आपल्या कोकण भेटीत दिले होते. त्यानुसार पुरातत्व वस्तूसंग्रहालय खात्याचे संचालक तेजस गर्गे यांच्या मार्गदर्शना खाली काम सुरूझाले आहे. ऋत्विज आपटे त्यासाठी कार्यरत असून, कातळशिल्पांना राज्यसंरक्षित दर्जा देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. लवकरच या शिल्पांना राज्यसंरक्षितदर्जा प्राप्त होणार आहे. कातळशिल्पांबाबतचे आकर्षण पर्यटकांमध्ये वाढले आहे. अनेक पर्यटक खास कातळशिल्प पाहण्यासाठीसहली आयोजित करीत आहेत. भविष्यात ही कातळशिल्पे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावरही चांगला परिणाम होऊन स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची संधी यामित्ताने उपलब्ध होणार आहे.या कातळशिल्पांमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार असून, जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर येणार आहे._*
लांजा तालुका - भडे, हर्चे, रूण, खानावली, रावारी, लावगण
🔹अश्मयुगीन कातळचित्रे🔹
रत्नागिरी जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरातएक हजारपेक्षा अधिक कातळशिल्पे असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत.मंडणगड व गुहागर तालुक्यातही कातळशिल्पे सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात सात हजारपेक्षा अधिक पर्यटकांनी या कातळशिल्पांना भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. आॅस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिकेतील पर्यटक याठिकाणी भेट देत आहेत. ही सर्व अश्मयुगीन काळातील कातळचित्रआहेत.
🔹चुंबकीय विस्थापन🔹
राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे येथे २.२५ मीटर त्रिज्येचे वर्तुळ काढण्यात आले असून, इथं चुंबकीय विस्थापन आढळते. ज्याठिकाणी मनुष्याकृती कोरली आहे तिथे चुंबकसूची पूर्णपणे विरूध्द दिशा दाखवते. गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुरेंद्रठाकूरदेसाई यांनी याबाबत केलेल्याप्राथमिक चाचण्यांमध्ये विशिष्ट अणूरचनेमुळे चुंबकसुई स्थिर राहत नाही. ती विरूध्द दिशा दाखवते, हे स्पष्ट झाले आहे.
उत्तर लिहिले · 17/6/2020
माहिती सेवा ग्रूप अनिल पाटील पेठवडगाव कोल्हापूर
कर्म · 333615
कोकणात अनेक ठिकाणी कातळशिल्प आहेत. त्यापैकी काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत:
रत्नागिरी जिल्हा:
गणेशगुळे: येथे विविध प्रकारची कातळशिल्पे आहेत.
बारसू: बारसू येथील कातळशिल्पे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहेत. टाइम्स ऑफ इंडियामधील बातमी
देवरुख: देवरुखमध्येही काही कातळशिल्पे आढळतात.
सिंधुदुर्ग जिल्हा:
फोंडाघाट: फोंडाघाट येथे अनेक दुर्मिळ कातळशिल्पे आहेत.
कुडोपी: कुडोपीमध्येही काही सुंदर कातळशिल्पे आहेत.
या व्यतिरिक्त, कोकणातील अनेक गावांमध्ये कातळशिल्पे विखुरलेली आहेत.
marathi.freepressjournal.in
रत्नागिरीतील देऊडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक, पर्यटकांकरिता ठरले नवे आकर्षण
Swapnil S
~2 minutes
रत्नागिरीतील देऊडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक
Published on:
11 Aug 2024, 10:15 am
मुंबई : राज्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देऊड कातळशिल्प ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आहे. राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.
रत्नागिरीसह राजापूर तालुक्यात अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालकांच्यामार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील देऊड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आले होते.
ते संरक्षित स्मारक करण्याची घोषणा शासनाने केली होती. यासंदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने शासनाने अखेर संरक्षित स्मारक म्हणून हे कातळशिल्प जाहीर केल्याचे शासनाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
कातळशिल्प परिसरातील ३१० चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित
देऊड येथे कोरलेले मध्याश्मयुगीन कातळशिल्प आढळले आहे. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि इतर पावलांचे ठसांचे चित्र रेखाटण्यात आली आहेत. एकूण १० बाय १० चौरस मीटर असे एकूण १०० चौरस मीटर इतके आहे. पूर्वेला ५, पश्चिमेला ५, दक्षिणेला ५ आणि उत्तरेला ५ मीटर जागा आहे. कातळशिल्प परिसरातील ३१० चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.
ratnagirikhabardar.com
आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प विषयावर चार शोधनिबंधांचे सादरीकरण - Ratnagiri Khabardar
~3 minutes
रत्नागिरी : जागतिक पुरातत्त्व काँग्रेसद्वारा आयोजित डार्विन, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प या विषयावर आधारित चार शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्या रत्नागिरी टीमतर्फे तीन शोधनिबंधांचे ऑनलाइन व कोळोशी अश्मयुगीन गुहा पुरातत्वीय उत्खनन टीमतर्फे ऑस्ट्रेलियात जाऊन एका शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणातील कातळशिल्पांचे आश्वासक पाऊल पडले आहे.
रत्नागिरीत कातळशिल्प, शोध व संशोधनासाठी शोधकर्ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकुर-देसाई यांनी २०१२ पासून सुरुवात झाली. २०१५ पासून कातळशिल्प मिळायला सुरुवात झाली. शोध कर्त्यांनी एकेक कार्यकर्ते जोडले आणि गेल्या २०० पेक्षा अधिक ३००० च्या घरात चित्रे सापडली आहेत. त्यानंतर कातळशिल्पांचे जागतिक वारसास्थळामराठी नामांकन झाले. रत्नागिरीत वारसा संशोधन केंद्र सुरू झाले, ही मोठी घडामोड आहे.
संथ आणि सुरक्षित गतीने रॉक आर्ट संशोधन आणि सराव, पुरातनता आणि सातत्य, दस्तऐवजीकरण, पुरातनता आणि सहसंबंध आणि व्यापार, स्थलांतर, वसाहत नेटवर्क या चार संकल्पनांवर शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले, टीममधील
तरुण अभ्यासकांनी संशोधन निबंध सादरीकरण करावे विचारातून दिव्यांश सिन्हा, तार्किक खातू यांनी टीम कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्यावतीने कोकणातील कातळशिल्प या विषयावर शोधनिबंधाचे ऑनलाइन सादरीकरण केले. आतापर्यंत झालेले काम हे पूर्णपणे लोकसहभागातून झाले आहे. त्याचे महत्व लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे होते. त्याबाबतचे वाचन निसर्गयात्री संस्थेच्या सभासदांच्यावतीने ऋत्विज आपटे यांनी केले.
कोळोशी टीमच्यावतीने प्रा. पार्थ चौहान यांनी कोळोशी अश्मयुगीन गुहा उत्खनन या विषयावर प्रत्यक्ष ऑस्ट्रेलिया येथे जाऊन शोधनिबंधाचे सादरीकरण केले. सातत्याने अखिलेश झा, डॉ. तेजस गर्गे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी पाठबळ दिले.
दोन हजार जणांचा सहभाग
१९८६ पासून दर चार वर्षांनी ही परिषद भरवली जाते. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापीठ आणि डार्विन विद्यापीठ या ठिकाणी याचे आयोजन यंदा केले. जगभरातून दोन हजारांहून अधिक अभ्यासक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यात भाग घेतला.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प या विषयावर आधारित शोधनिबंध सादरीकरणाची संधी मिळाली, याचा आनंद आहे. या शोधनिबंधाद्वारे कातळशिल्प, संबंधित पुरावे आणि कालखंड अधोरेखित करण्यात आहे. जागतिक पटलावर एकावेळी विविध आयामांनी सादर केलेल्या कातळशिल्प विषयाला अत्यंत व्यापक व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. – सुधीर रिसबूड.
marathi.indiatimes.com
दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार
सूरज कोळेकर
3–4 minutes
दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार
Edited by: सूरज कोळेकर|महाराष्ट्र टाइम्स•3 Mar 2024, 2:24 pm
Chiplun News: दक्षिण रत्नागिरीतील राजापूर आणि लांजाप्रमाणेच आता उत्तर रत्नागिरीतील दापोली आणि मंडणगड येथे कातळशिल्पे आढळली आहेत. या कातळशिल्पांवर मानवाकृतीसोबतच हरणे आणि बैल प्राण्यांचे चित्रे आहेत
हायलाइट्स:
दापोली-मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा
मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे
मानवाला शेतीचा शोध लागल्यानंतरची कातळशिल्पे असल्याचा अंदाज
दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प
दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प (फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक आहे. तर मंडणगड तालुक्यातही कातळशिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. डॉ. अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत, त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या कातळशिल्पांचे रहस्य उघडणार आहे.उंबर्ले गावात 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळशिल्पे आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे व दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत. मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते. कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे आजपासून किमान पाच ते सहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत, असा अंदाज करता येतो. बैल हा प्राणी असल्याने, या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन, म्हणजे मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा, असा अंदाज आहे. अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे डॉ. धनावडे यांनी नमूद केले.
मंडणगड तालुक्यातील गोठे, धामणी, बोरखत, वेरळ या चार गावांच्या सीमेवरील वाघाचा कातळ या ठिकाणी आढळून आलेल्या कातळशिल्पाचा तोंडाकडचा भाग भग्नावस्थेत असल्याने तो डुक्कर किंवा गेंडा असण्याची शक्यता आहे. मंडणगड तालुक्यात आजवर कातळशिल्पांची नोंद झालेली नव्हती. मात्र सावित्री नदीच्या दक्षिण काठावरील गावांच्या सड्यावर हे उल्लेखनीय शिल्प आढळल्याने अभ्यासाला वेगळी दिशा मिळणार आहे. माणूस शिकारी अवस्थेत, भटक्या वृत्तीचा होता, त्या काळातील त्याच्या बुद्धीचा आवाका आणि उपलब्ध साधनांआधारे ही चित्रे त्याने कोरली. अशाच पद्धतीची आणखी कातळशिल्पे या परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू आहे.
कातळशिल्पे ही कोकणात केवळ जांभ्या सड्यावर आढळली आहेत. कोकणातील कातळशिल्पे अश्मयुगीन काळातील असून त्यांचा कालखंड मध्यअश्मयुगीन असून आजपासून सुमारे दहा हजार वर्षे ते तीन हजार वर्षे इतका जुना असण्याची शक्यता मानली जाते.
२०० प्रकार, एक हजारहून अधिक वृक्षांचं संवर्धन; पर्यावरण प्रेमींनी अडीच एकरात उभारलं ऑक्सिजन पार्क
जतन व्हावे
कातळशिल्पे ही कोकणातील अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत, हे आता सर्वमान्य झाले आहे. पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग (महाराष्ट्र राज्य), कोकण इतिहास परिषद, निसर्गयात्री संस्था रत्नागिरी, देवगड अभ्यास मंडळ देवगड अशा अनेक सरकारी व स्वयंसेवी संस्थांनी तसेच अनेक हौशी भटक्यांनी ही शिल्पे शोधली आहेत. या कातळशिल्पांचे सरकारकडून जतन व्हावे, अशी प्रतिक्रिया अभ्यासक डॉ. अजय धनावडे यांनी दिली. कातळशिल्पे पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढणार असल्याने, या शिल्पांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
pudhari.news
सिंधुदुर्ग : धामापूर गावात आढळली कातळशिल्पे
मोहन कारंडे
3–4 minutes
Published on:
02 Aug 2023, 9:51 am
Updated on:
02 Aug 2023, 2:13 pm
मालवण; पुढारी वृत्तसेवा : मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या सड्यावर कातळशिल्पांच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. सद्यस्थितीत सड्यावरील कातळावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पांच्या चित्रकृती निदर्शनास आल्या असून इतिहास संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे.
मालवण तालुक्यातील धामापूर गाव हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट जंगले, नारळ-पोफळीची झाडे आहेत. दुतर्फा डोंगराच्याच मधोमध वसलेला ऐतिहासिक तलाव ही या गावची वैशिष्ट्य आहेत. तलावाच्या काठावर श्री भगवती देवीचे प्राचीन देवालय आहे. अलीकडेच धामापूर तलावाला 'वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट'चा दर्जा देऊन महाराष्ट्राचा जागतिक सन्मान करण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक आणि प्राचीन पार्श्वभूमी असलेल्या धामापूरमध्ये कातळशिल्पांचा खजिना सापडल्याने हेरिटेज टुरिझमसाठी नवे द्वार खुले होणार आहे.
धामापूर, मोगरणे आणि साळेल या तिन्ही गावांच्या लांबलचक सड्यावर ही कातळशिल्पे दिसून आली आहेत. धामापूर गावच्या गोड्याचीवाडीच्या हद्दीत ही कातळशिल्पे आढळून आली आहेत. "कातळशिल्पे दोन-चार ठिकाणी आहेत, याबाबत आम्हाला कल्पना आहे. मात्र त्याबद्दल सविस्तर माहिती नाही," असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. धामापूर तलाव आणि कातळशिल्पांचा प्राचीन ठेवा पर्यटनदृष्ट्या पर्वणी ठरणारा असून कातळशिल्पाच्या चित्रकृतीचा उलगडा होणे आवश्यक आहे.
साळेल गावचे ग्रामस्थ परेश गावडे, नंदू गावडे, गणेश गावडे हे धामापूर सडा परिसरात 'अळंबी' काढण्यासाठी फिरत असताना त्यांना ही कातळशिल्प निदर्शनास पडली. त्यांनी पत्रकार सिद्धेश आचरेकर यांना याबाबत माहिती दिली. पत्रकार आचरेकर यांनी धामापूर सड्यावर परेश गावडे यांच्या समवेत जाऊन कातळशिल्पांची पाहणी केली. याठिकाणी असलेली ख्रिस्ती धर्मातील 'क्रॉस'च्या आकाराची चित्रकृती निदर्शनास येण्यासाठी आचरेकर, गावडे, अनिकेत पाटील (डोंबिवली) यांनी त्या चित्रकृतीच्या बाजूने गोलाकार दगड ठेवले. बाजूलाच गोलाकार स्थितीत कातळशिल्प कोरलेले आहे. त्याच ठिकाणाहून ५०० मीटरवर आणखीन एक भव्य कातळशिल्प कोरलेले आहे.
साळेलमधील युवकांकडून जागरूकता
साळेल गावातील युवकांनी ही कातळशिल्पे उजेडात आणली. कातळशिल्पांच्या सभोवताली युवकांनी साफसफाईदेखील केली आहे. मात्र पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या परिसरात गवत उगवत आहे. कातळशिल्प आढळून आलेल्या परिसरात चिरेखाणी असल्याने कातळशिल्पे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे अमूल्य ठेवा जोपासण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कातळशिल्पांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी साळेल, मोगरणे गावातून रस्ता आहे.
मालवण तालुक्यात सर्वाधिक कातळशिल्पे
बहुतांशी कातळ शिल्पे ही उंच अशा माळरानावर म्हणजेच सड्यावरील कातळात कोरलेली असल्याने त्यांना कातळ शिल्पे असे संबोधले जाते. मालवण तालुक्यात आणखी काही ठिकाणी अशा प्रकारची कातळशिल्पे सापडू शकतात. मात्र अशा शिल्पांबाबत ग्रामस्थांमध्ये तेवढी जागरूकता व माहिती दिसून येत नाही. मात्र अशा शिल्पांचा शोध घेणे गरजेचे असून इतिहास संशोधकांची यामध्ये महत्वाची भूमिका राहणार आहे.
daryafirasti.com
कोकणातील अद्भुत कातळशिल्पे
chinmayebhave
4–6 minutes
कशेळीच्या डोंगरसड्यावरचा हा अजस्त्र हत्ती… आणि त्यात कोरलेली असंख्य चित्रे … विविध प्राणी … काही जलचरही .. काय सांगत असतील ही चित्रे? कोकणात दर्या फिरस्ती प्रकल्पासाठी हिंडत असताना कोकणातील कातळशिल्पांबद्दल मला समजलं आणि त्याबद्दल उत्सुकता होतीच. मध्यंतरी बीबीसी मराठी आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्स ने ही या विषयाची दखल घेतली आहे. या जमिनीला कॅनव्हास करून खोदलेल्या कातळशिल्पांचा आकार इतका मोठा आहे की फोटो काढायला काही ठिकाणी ड्रोन असेल तरच त्यातील रेषा आणि चिन्हे एका दृष्टीक्षेपात नीट दिसतील. दर्या फिरस्ती म्हणजे कोकणच्या दृश्य संस्कृतीच्या प्रत्येक पैलूचे चित्रण मग इतक्या महत्वाच्या पुरातत्व ठेव्याचे चित्रण तर अजून मोठी जबाबदारी ठरते. ही चित्रे रत्नागिरी जिल्ह्यात उक्षी सारख्या उत्तरेतील ठिकाणापासून देवाचे गोठणे सारख्या दक्षिणेकडील ठिकाणाच्याही पुढे दीड दोनशे किलोमीटरच्या टप्प्यात विखुरलेली आहेत. आणि हे अंतर सरळ रेषेतल्या महामार्गाने मोजायचे नाही बरं का! काल आम्ही ५ साईटचे फील्डवर्क केले त्याला संपूर्ण दिवस लागला.
Kolambe petroglyph
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीची सुटावलेली टोके अगदी समुद्राला जाऊन भिडलेली आहेत. नकाशात बाजूला ५-६ किलोमीटर दिसणारे गाव गाठायला दोन टेकड्या चढून उतरून नागमोडी वळणाच्या रस्त्याने जावे लागते. काही ठिकाणी ही कातळशिल्पे दूर एकांत ठिकाणी सड्यावर आहेत … तर काही ठिकाणी खासगी जमिनीवर घरांच्या प्लॉट्स च्या मधोमध. २०१२ पासून सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे या दोघांनी अशी १२०० कातळशिल्पे शोधून काढली आहेत. आता महाराष्ट्राचे पुरातत्व निर्देशक डॉ तेजस गर्गे आणि नव्या दमाचा आर्किओलॉजिस्ट ऋत्विज आपटे या कातळशिल्पांवर सरकारी आणि संशोधनाच्या दृष्टीने बहुमोल काम करत आहेत. सुमारे १० हजार ते ४० हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता असलेली ही कातळशिल्पे कोकणच्या इतिहासाची दालने उघडू शकतील. इथं विविध प्राणी आहेत, त्यांच्या आत कोरलेले प्राणी आणि चिन्हे आहेत. मनुष्य आकृती आहेत आणि abstract किंवा अमूर्त चित्रेही आहेत.
Kolambe petroglyph
ही चित्रे खोदण्यामागचं प्रयोजन काय? या ओळखीच्या खुणा असतील की संदेश? एकच चित्र कुठं पुन्हा दुसरीकडे सापडते आहे असं नाही मग या चित्रभाषेला अर्थ असेल का? की हा तेव्हाच्या सांस्कृतिक/ धार्मिक कर्मकांडाचा भाग असेल? यात असलेले प्राणी पूर्वी कोकणात असतील का? या चित्रांमध्ये कुठेही शेती नाही … मग प्राणी आहेत म्हणजे शिकार करून जगणाऱ्या मानवाचा ठेवा आहे का हा? जितकं जास्त या चित्रांबद्दल समजेल, कुतूहल आणि गूढरम्यता तितकीच अजून वाढत जाणार आहे.
Nivali petroglyph
संशोधन सुरु आहे … जतन सुरु आहे .. नवीन कातळशिल्पे सापडत आहेत … त्याबद्दल उत्सुकता वाढत आहे आणि पर्यटन सुरु होते आहे. जिथं कातळशिल्पे खासगी जमिनीवर आहेत तिथं प्रश्न आर्थिकही आहेत … या चित्रांना पाहायला येणाऱ्या लोकांच्या पर्यटनातून कोकणच्या आर्थिक व्यवस्थेलाही लाभ आहे … कधीकधी छंद म्हणून सुरु झालेले वेडे प्रवास माणसाला आणि त्याच्याबरोबरच्या अनेकांना खूप दूर घेऊन जातात.
Rundhyetali petroglyph
देवीहसोळ येथे आर्यादुर्गा देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्या देवळासमोरच एक अमूर्त पद्धतीचे कातळशिल्प आहे. हे बरेच आतवर खोदलेले कोरीवकाम आहे. कोणती हत्यारे किंवा तंत्रज्ञान वापरून ही कातळशिल्पे खोदली गेली असावीत याबद्दलही कुतूहल निर्माण होते. स्थानिक मंदिरांच्या दंतकथा आणि कर्मकांडांमध्ये या शिल्पांना स्थान मिळालेले आहे. आजही या कातळशिल्पांचा आकार, त्यामधील प्रमाणबद्धता थक्क करणारी आहे.
Devihasol petroglyph
देवाचे गोठणे या ठिकाणी असलेल्या कातळशिल्पाची अजून एक गंमत आहे. शिल्प दिसायला तसे साधेच आहे. मानवी आकृतीचे पाय इथं दिसतात. पण इथं जर होकायंत्र ठेवलं तर त्याला उत्तर दिशा दाखवणे जमत नाही. काट्याची गडबड होते.
बारसू इथं खोदलेल्या कातळशिल्पांमध्ये व्याघ्रप्रतिमा दिसतात आणि सोबत मानवी आकृती दिसते. ही देवतेची कल्पना आहे का? की शिकारीचे चित्रण? गेंडा किंवा पाणघोडा असे कोकणात ज्ञात नसलेले प्राणीही अनेक ठिकाणी कातळशिल्पांमध्ये आहेत. हा मानव स्थलांतरित होता म्हणून हे प्राणी दिसतात का? की पूर्वी कोकणात हे प्राणी होते. कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत आणि संशोधनाचे आव्हान आपल्यासमोर ठेवत आहेत.
Barsu petroglyph
काही आकृती इतक्या विलक्षण आहेत की या रेखांकनापासून प्रेरणा घेऊन एखादा एम एफ हुसेन, दीनानाथ दलाल, पिकासो नवीन फॉर्म्स असलेली चित्रे निर्माण करू शकेल.
Barsu petroglyph
मला सगळ्यात विलक्षण वाटलेली गोष्ट म्हणजे काही कातळशिल्पांमध्ये खोल समुद्रात आढळणारे प्राणीसुद्धा रेखलेले दिसतात. स्टिंग रे, शार्क .. त्यांच्या मूळ आकारात आणि अतिशय बारकावे अभ्यासून चित्रित केलेले. सगळंच फोटोत दाखवलं तर पाहण्यात काय गंमत आहे. तेव्हा तुम्हाला आवाहन करतोय की कोकण भ्रमंतीचा बेत जमवा आणि ही कातळशिल्पे आवर्जून पहा. आणि हे करत असताना स्थानिकांची मदत नक्की घ्या.
सुधीर (भाई) रिसबूड निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून इथं बरंच काम करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन या आदिम मानवाच्या किमयेचा आनंद घ्या. सुधीर रिसबूड यांचा क्रमांक +९१९४२२३७२०२०
ratnagirikhabardar.com
गुहागर : रानवी येथील सड्यावर सहा कातळशिल्प - Ratnagiri Khabardar
~3 minutes
गुहागर : निसर्ग संरक्षणासाठी गेल्या काही वर्षापासून काम करत असलेल्या येथील सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थेच्या तीन सदस्यांना जंगलभ्रमंती दरम्यान गुहागर तालूक्यातील रानवी येथील कातळसडयावर एक नव्हे, दोन नव्हे तब्बल सहा कातळशिल्प प्रतिकृतींच्या पाऊलखुणा दिसून आल्या आहेत. एका भागात, दोन ठिकाणा प्रत्येकी तीन, त्याही वेगवेगळया रूपात सापडलेल्या तब्बल सहा प्रतिकृतींमुळे कातळशिल्प संशोधकांना संशोधनासाठी इतिहासाचा आणखी एक खजिना सापडला आहे. सध्या संस्थेसह पुणेतील अभ्यासकांच्या माध्यमातून या कातळशिल्पांच्या अभ्यास सुरू आहे.
अवघ्या महाराष्ट्रात निसर्ग संरक्षण, पर्यावरण, वन्यजीवरक्षण, वणवामुक्ती, जंगल पर्यटन याशिवाय आदिवासी पाडयांच्या अडाणीत धावणाऱ्या सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थाच्या सदफ कडवेकर, राणी प्रभुलकर आणि शुभम कुरधुंडकर यांचे काम मोठे आहे. गेल्या अनेक वर्षापासून सहयाद्रीच्या खोऱ्यात ते निसर्ग संरक्षण आणि वन्यजीवांसाठी काम करत आहेत. जंगल भटकंती करत असताना रानवी येथील जंगलात मधोमध असलेल्या कातळावर ही शिल्पे आढळून आली आहेत.
रानवी गावाला विस्तीर्ण कातळसडा तसेच देखणी किनारपट्टी लाभली आहे. पावसाळ्यात खुलून येणारे, जैवविविधतेने नटणारे हे माळरान फार लक्षवेधी असते. तेच माळरान पावसाळ्यानंतर मात्र उजाड दिसू लागते. पण अशाच या उजाड आणि निरुपयोगी वाटणाऱ्या माळरानाने अशा प्रकारचा अनोखा ऐतिहासिक वारसा आपल्या कुशीत जपलेला आढळून आला आहे. कोकणातील ही कातळ कोरीव शिल्पे स्वतच्या अस्तित्वाच्या खुणांसोबत बरेचसे प्रश्न उपस्थित करत असल्याने त्याकडे अभ्यासकांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे.
कातळशिल्पांमध्ये कोकणातील पठारी जैवविविधता तसेच समुद्रीजीवन आणि याव्यतिरिक्त हत्ती, गेंडा यांसारख्या महाकाय प्राण्यांचे आकार आढळलेले आहेत. तसेच त्यावेळच्या प्रवासादरम्यानच्या घटना या शिल्पांमध्ये पाहायला मिळतात. अनेक प्रतिकृतांया आकारांचे अर्थ अद्यापही उलगडलेले नाहीत. रानवी येथेही चारही बाजूने जंगल आणि मधोमध असलेल्या कातळसडयावर दोन ठिकाणी प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा शिल्प आढळून आली. त्यामध्ये दोन शिल्प प्रतिकृती या मानवी आकाराया असून अन्य चार प्रतिकृतींचे अर्थ उलगडताना दिसत नाहीत. त्यासाठी सह्याद्री संवर्धन व संशोधन संस्थाच्या माध्यमातून त्याबरोबर पुणे येथील कातळशिल्प अभ्यासक मिलिंद वाटवे यांच्या माध्यमातूनही अभ्यास सुरू आहे.
zeenews.india.com
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र
Mansi kshirsagar
2–3 minutes
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र
Geoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्र
Ancient Maharashtra rock art in ratnagiri declared protected monument
Geoglyphs In Konkan: कोकणात अनेक ऐतिहासिक स्थानं आहेत. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले जातात. कोकणातील अनेक भागात कातळशिल्प मोठ्या प्रमाणात आढळतात. अश्मयुगीन काळातील ही काताळशिल्प म्हणजे जणू गुढच आहे. इतिहासपूर्व काळातील मानवी संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत. कोकणातील कातळशिल्प ही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यात आता आणखी एका कातळशिल्पाची भर पडली आहे. राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देउड कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
रत्नागिरीसह राजापूर तालुक्यातील अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनायाच्यामार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गंत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केले जात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील देउड येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आले होते. हे कोरलेले मध्याश्मयुगीन कातळशिल्प आहे. या कातळावर एकशिंगी गेंडा, गाढव, वानर, हरिण आणि इतर पावलांचे ठसे रेखाटण्यात आले आहे. एकूण 10 बाय 10 चौरस मीटर असे एकूण 100 चौरस मीटर इतके आहेत. कातळशिल्प परिसरातील 310 चौरस मीटर क्षेत्रफळ जागा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केली आहे. रत्नागिरीत देउड येथे सापडेले काताळशिल्प हे मध्यमपाषाण युगातील आहेत म्हणजेच जवळपास 20,000 ते 10,000 वर्षांपूर्वीचे आहेत.
महाराष्ट्र व गोव्याजवळ 900 किमी क्षेत्रावर हे कातळशिल्प पसरले आहेत. फक्त रत्नागिरीतच 70 ठिकाणी 1,500 हून अधिक अशा कलाकृती आहेत. ज्यातील सात कलाकृतींना युनेस्कोने संरक्षित स्मारक म्हणून मान्यता दिली आहे. कोकणातील ही कातळशिल्पे अरबी समुद्र आणि लगतचा सह्याद्री या भूभागातील रत्नागिरी ते सिंधुदुर्ग परिसरातील जवळपास १७० किमी लांब आणि २५ किमी रुंद पट्ट्यात आढळली आहेत
evivek.com
कोकणातील कातळशिल्पे
विवेक मराठी
15–19 minutes
@ऋत्विज आपटे
कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारे, नारळीपोफळीची झाडे, प्राचीन मंदिरे, त्यासोबतच अजून टिकवून ठेवलेल्या सणांच्या आणि उत्सवांच्या परंपरा. भारतीय उपखंडात बाहेरच्या देशांतील येणार्या पर्यटकांचे मूळ आकर्षणबिंदू म्हणजे पहिले नैसर्गिक आणि दुसरे म्हणजे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक. कोकण किनारपट्टीत ही दोन्ही संसाधने मुबलक आहेत. हे पर्यटनाचे आकर्षणबिंदू असले तरी या गोष्टींच्या पल्याड जाऊन अशा अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या कित्येक गोष्टी कोकणात लुप्त होऊन बसलेल्या आता समोर येताना दिसत आहेत. त्यातील अश्मयुगीन म्हणावा असा वारसा गेल्या काही वर्षांत कोकणात समोर येताना दिसतो आहे, तो म्हणजे कातळखोद चित्र (कातळशिल्प) रूपाने. अश्मयुगीन मानवाने त्याच्या भावभावनांचा मांडलेला एक मोठा पट म्हणजे कातळखोद.
Katal Shilp Konkan
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात अरबी समुद्राशी संलग्न असलेली 720 किलोमीटर लांब आणि अंदाजे 30 किलोमीटर रुंद किनारपट्टीचा भाग म्हणजेच कोकण किनारपट्टी. निसर्गसंपन्न आणि विविध सांस्कृतिक रहस्ये दडवून असलेला हा भाग म्हणजे वारसा पर्यटनासाठी एक आतापर्यंत कधीही जगासमोर न आलेला भाग आहे. कोकणातील पर्यटन हे साधारणपणे सामान्य नागरिकांसाठी समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि धार्मिक बाबींवर चालणारे आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्धीस आला. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता संपूर्ण कोकण हळूहळू पर्यटनावर भर देऊ पाहात आहे जी एका दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे. कोकणाला निसर्गसंपन्न किनारा आहे, नारळीपोफळीचे वरदान आहे, सोबतच ह्या ठरावीक गोष्टींच्या पल्याड जाऊन अशा अनेक ऐतिहासिक वारसा असलेल्या कित्येक गोष्टी कोकणात लुप्त होऊन बसलेल्या आता समोर येताना दिसत आहेत. एवढे सगळे असूनसुद्धा म्हणावी तशी पर्यटनवृद्धी काही कोकणात झालेली नाही. आता त्यामागे अनेक कारणे आहेत. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे स्थानिकांमध्ये जनजागृती. स्थानिकांना त्याबाबत माहिती आहे; परंतु त्याचा वापर पर्यटनवाढीसाठी कसा करावा ह्याची योग्य जाण अजून कोकणातल्या स्थानिकांना नाही.
भारतीय उपखंडात बाहेरच्या देशांतील येणार्या पर्यटकांचे मूळ आकर्षणबिंदू हे दोन आहेत. एक म्हणजे नैसर्गिक आणि दुसरं म्हणजे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक. नशिबाने कोकण किनारपट्टीला ह्या दोन्ही संसाधनांचा उत्तम वरदहस्त लाभलेला आहे. नैसर्गिक समुद्रकिनारे, धबधबे, फुलं वगैरे गोष्टी तर आहेतच; पण सोबतीने गणेशोत्सव, शिमगा, नवरात्री, दिवाळी ह्या सणवार आणि उत्सवांचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. सोबतच नृत्य, नाट्य ह्यांच्या संगमाने युक्त असे अनेक नृत्यनाट्याविष्कार जसे की नमन, जाखडी, दशावतार वगैरे सांस्कृतिक बाबी अजून तरी कोकणात जपून ठेवण्यात स्थानिक लोक यशस्वी झालेले दिसून येतात. कोकणातला हा अमूर्त वारसा दशावतार, नमन आणि गणेशोत्सवाच्या माध्यमांतून जगभरात पोहोचला; पण कोकणातल्या मूर्त वारशाचे काय? मुळात आधी वारसा म्हणजे काय ते आपण जाणून घ्यायला हवे. थोडक्यात सांगायचे झाल्यास वारसा म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या मूर्त आणि अमूर्त संकल्पना, गोष्टी. ह्यामध्ये अगदी छोट्याशा कागदापासून एखादा मोठा सणवार, उत्सव तसेच पाषाणात कोरलेल्या मूर्तीसुद्धा येतात. हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा हे सामान्यपणे पिढ्यान्पिढ्या चालत आलेले असते. एखादी वास्तू वारसा म्हणून सांगताना त्या वास्तूमुळे त्या भौगोलिक भागावर पडलेला प्रभाव, त्या वास्तूचे राजकीय किंवा सामाजिक स्थान, या गोष्टींचा विचार केला जातो. त्याशिवाय ती त्या त्या काळातील विचारशैलीचे; धार्मिक, सामाजिक अभिसरणाचे, समृद्धीचे, विचारप्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारचा विविध कालखंडांतील वारसा कोकणात मूर्त आणि अमूर्त दोन्ही प्रकाराने दिसून येतो.
अमूर्त वारसा तर आपण पाहिलाच. आता मूर्त वारसा पाहताना कोकण किनारपट्टी ही फार पूर्वीपासून व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्रस्थान म्हणून गणली गेलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागांतील अनेक ऐतिहासिक शहरे, त्यात तयार होणार्या वस्तू ह्यांचा व्यापार हा कोकण किनारपट्टीवरून विविध देशांत केला जात असे. ह्या काळात व्यापार्यांना राहण्यासाठी म्हणून तयार केलेल्या अनेक लेण्या कोकणात कोरलेल्या दिसतात. ह्या लेण्या कोण्या एका धर्माशी किंवा कोण्या एका राजघराण्याशी संबंधित नसून विविध कालखंडांत विविध राज्यांनी विविध धर्म आणि संस्कृतींच्या उद्धारासाठी ह्या बांधलेल्या दिसतात. मुंबईत असणार्या कान्हेरी लेण्या, एलिफंटा लेणी, रायगड जिल्ह्यातील कुडा,रत्नागिरीमधील पन्हाळेकाजी, खेडच्या लेण्या, लांजा येथील कातळगांव, सोबतच सिंधुदुर्गात असलेले विमलेश्वर इत्यादी लेण्या ह्या वारसा पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत. हल्लीच राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी जांभा दगडातील एकाश्म मंदिरेसुद्धा समोर येत आहेत. लेण्यांबरोबरच अनेक जुनी काळ्या पाषाणात विविध राजवटींत बांधलेली मंदिरे कोकणात दिसून येतात, त्यामध्ये कसबा संगमेश्वर आहे, कुणकेश्वर आहे, कनकादित्य मंदिर आहे, तसेच मराठाकालीन उतरत्या छपराची जवळपास 1000 छोटीमोठी मंदिरे कोकणात विविध ठिकाणी दिसून येतात.मराठाकालीन मंदिरांच्या बरोबरीने त्याच काळातील अनेक गड आणि किल्ले कोकणात दिसतात. त्यात अगदी प्रबळगडासारखा वनदुर्गपण आहे आणि मुरुड जंजिरा, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्गसारखेसमुद्री किल्लेसुद्धा आहेत. ह्या प्रकारचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा हा पर्यटनाला चालना देण्यासाठी पुष्कळ आहे; परंतु ह्याच्यापल्याड जाऊन अगदी अश्मयुगीन म्हणावा असा वारसा गेल्या काही वर्षांत कोकणात समोर येताना दिसतो आहे, तो म्हणजे कातळखोद चित्र (कातळशिल्प) रूपाने.
गेल्या दहाएक वर्षांत अश्मयुगीन मानवाने त्याच्या भावभावनांचा मांडलेला एक मोठा पट जो कातळखोद चित्रांच्या रूपाने आता जगासमोर आणला जात आहे. मी आणि माझे सहकारी गेली काही वर्षे ह्या चित्रांवर अभ्यास करतो आहोत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 110 गावांमध्ये 150 ठिकाणी 2000 हून अधिक चित्रे आढळून आली आहेत. ही चित्रे कोकणातल्या सड्यावर म्हणजेच आडव्या पसरलेल्या जांभ्या दगडाच्या पठारावर कोरलेली आहेत.
Katal Shilp Konkan
हा आडवा पसरलेला जांभा दगडाचा सडा गेली अनेक वर्षे अनेक गुपिते आपल्या पोटात ठेवून आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे ही कातळखोेद चित्रे. 2012 साली आडवळणावरच कोकण ह्या संकल्पनेतून चालू झालेला आडवळणावरचा प्रवास आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ होण्याच्या दिशेने निघालेला आहे. आता नक्की ही कातळखोद शिल्पे म्हणजे काय? तर हा प्रागैतिहासिक मानवाच्या कलेचा एक भाग आहे. प्रागैतिहासिक भित्तिचित्र ह्या प्रकारात तीन महत्त्वाचे भाग आहेत.
पिक्टोग्राफ- चित्ररंगांचा वापर करून
पेट्रोग्लीफ- दगडावर कोरणे
जिओग्लीफ/अर्थ फिगर- आडव्या जमिनीवर कोरणे
आता ह्या तीन भागांपैकी तिसरा भाग हा कोकणात जांभ्या दगडाच्या सड्यावर आढळून येतो. 2000 हून अधिक चित्रांची नोंद करताना अनेक संदर्भांचा मागोवा घेत राहिलो होतो. त्यानंतर मग ह्या एवढ्या चित्रांची त्यांच्या आकारानुसार विभागणी केली. तेव्हा आढळून आले की, ह्यामध्ये मानवी आकृती आहे, भौगोलिक आकृत्या आहेत तसेच सोबतीने अनेक प्राणी आणि पक्ष्यांचेसुद्धा अंकन केलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ह्यामध्ये जे काही प्राणी कोरले आहेत ते एक तर आकाराने जेवढे असतात तेवढे आहेत किंवा त्याहून जास्त मोठे दाखवले गेले आहेत. आता ह्यामध्ये एकशिंगी गेंडा, हत्ती, हरिण वर्गातील प्राणी, विविध पक्षी, जलचर, उभयचर असे विविध प्रकार दिसून येतात. ह्या चित्रांसोबतच त्या काळी मानवाने शिकार करण्यासाठी बनवलेली हत्यारेसुद्धा आढळून येत आहेत. ह्याच्या कालखंडाबाबत जरी आता काही निश्चित माहिती हातात नसली तरी समोर येणारे पुरावे हेच सांगतात की, ही चित्रे कोकणात राहणार्या अश्मयुगीन माणसाने कोरलेली असावीत. ह्यातीलच नऊ साइट्स आता जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या प्रस्तावित यादीत नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील सात ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. एक सिंधुदुर्गातील आणि एक गोव्यातील आहे.
आता युनेस्कोसारख्या संस्थेनेसुद्धा ज्यांची दखल घेतली त्या कातळखोद चित्रांत एवढे काय वेगळेपण आहे? किंवा त्यांचे पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्व काय? ते आपण जाणून घेऊ. कोणत्याही ठिकाणी पुरातत्त्वीय अभ्यास करताना विविध गोष्टी विचारात घेऊन तो अभ्यास करायला लागतो. आधीच सांगितल्याप्रमाणे मंदिरे, एकाश्म मंदिरे ह्यांची बांधणी कधी केली गेली, कोणी केली वगैरे बर्यापैकी बाबी लिखित स्वरूपात उपलब्ध असतात; पण जेव्हा एखादा पुरातत्त्वज्ञ त्याच्यापल्याड जाऊन अजून जुन्या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा त्याबाबतचे पुरावे त्या भागात सापडणे गरजेचे असते. हे पुरावे सापडणे हे पुन्हा एकदा त्या भागाच्या पर्यावरणीय आणि वातावरणातील बदलांवर अवलंबून असते. भारतातील सगळ्यात जुने पुरावे हे राजस्थानमध्ये सापडतात, कारण तेथील वातावरण लाखो वर्षे जुन्या पुराव्यांना शाबूत ठेवण्यासाठी योग्य म्हणजेच शुष्क, कोरडे आहे. कोकणात ह्याच्या आत्यंतिक विरुद्ध परिस्थिती आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस आणि उष्ण कटिबंधीय भाग. कोकणात पुरातत्त्वीय अभ्यास न होण्याचे हे एक खूप महत्त्वाचे कारण आहे. कोकणातील कातळखोद चित्रे एवढ्या प्रतिकूल वातावरणात राहिली कशी, ह्याचेही उत्तर त्या जांभ्या खडकात आहे. जांभा दगडाला सच्छिद्रता असल्या कारणाने नैसर्गिक झीज अत्यंत कमी आहे म्हणूनच एवढी हजारो वर्षे ही चित्रे टिकून राहिली असावीत. वर लिहिल्याप्रमाणे चित्रांसोबत आम्हाला काही दगडी हत्यारेसुद्धा सापडली. त्याचा शोध मात्र फारच कठीण होता; पण त्याने एक गोष्ट नक्की केली, की इसवीसनपूर्व 20,000-5000 ह्या कालखंडातमानवाचे कोकणातल्या सड्यावर वास्तव्य नक्की होते; पण माणसाला जगायला ज्या प्रकारचे वातावरण लागते, तसे वातावरण तेव्हा होते का? कसा जगला माणूस आणि सोबतच ही चित्रांमधून दिसणारी जीवसृष्टीसुद्धा? ह्या सगळ्यांची उत्तरे कातळखोद चित्रांमधून आपल्याला मिळतात आणि हेच ह्या कातळखोद चित्रांचे वैशिष्ट्य आहे जे जगाला आता दिसून येते आहे.
Katal Shilp Konkan
कोकणात आतापर्यंत आम्हाला 2500 च्या सुमारास चित्रे आढळून आली आहेत, त्यामध्ये विविध प्रकार आढळून आलेले आहेत. जसे की मानवाकृती, भौमितिक आकृत्या आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी. काही पुराजीव अभ्यासकांच्या आणि चित्रकार कलाकार लोकांच्या म्हणण्यानुसार ही काढलेली चित्रे ही first hand drawing ह्या सदरात मोडणारी अशी आहेत, मेमरी drawing नव्हेत. म्हणजेच माणूस कुठे तरी एखादा प्राणी बघून आला आणि मग आठवून आठवून त्याचे चित्र काढले, अशी ही चित्रे नव्हेत. जे काही प्राणी, पक्षी तो माणूस दररोजच्या व्यवहारात पहात होता, अनुभवत होता, ते प्राणी त्याने अत्यंत बारीक बारकाव्यानिशी कोरलेले दिसतात. येथे हत्ती दिसतो. साधारणपणे बाराएक ठिकाणी हत्तीचे अंकन आहे. विविध आकार पाहता ते विविध वयांतील असावेत असे वाटते. सद्यःस्थितीत हत्ती कोकणात अस्तित्वात नाही. हा आदि दक्षिणेकडे सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर बॉर्डरवर दोडामार्ग वगैरे भागांत दिसतात तेवढेच. रत्नागिरीत तर नक्कीच नाहीयेत. अशीच बाब एकशिंगी गेंड्याच्या बाबतीत. एकशिंगी गेंडा जो आता फक्त आसाममध्ये दिसून येतो, त्याच्या आतापर्यंत सहा आकृत्या रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आलेल्या आहेत. साधारणपणे इसवीसनपूर्व 2000 पर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर महाराष्ट्र भागात गेंड्याचे अस्तित्व होते असे पुरावे विविध रूपांत आढळले आहेत; पण कोकणात गेंडा राहत होता ह्याचा पुरावा हा ह्या कातळखोद चित्रांच्या रूपाने समोर आला आहे. ह्या दोन महत्त्वाच्या प्राणांच्या आकृतीसोबतच एक आकृती मात्र अत्यंत कोड्यात टाकणारी आहे ती म्हणजे कशेळी येथे सापडलेली पाणघोडासदृश आकृती. काही पुराजीव अभ्यासकांच्या मते ते 12 फूट लांब आणि 5 फूट उंचीचे चित्र हे पाणघोड्याचे असावे. आता पाणघोड्याच्या अस्तित्वाचा शेवटचा म्हणजेच उशिरात उशिराचा पुरावा हा लातूरमधल्या मांजरा नदीच्या खोर्यात करण्यात आलेल्या उत्खननातून मिळतो. तेथे पाणघोड्यासोबत गेंडा, मगर वगैरे इतर प्राण्यांचेसुद्धा जीवाश्म सापडले आहेत ज्याचा कालखंड साधारणपणे 25-40000 वर्षे एवढा मागे जातो. महाराष्ट्राच्या दक्षिणेला गेंड्याचे पुरातत्त्वीय पुरावे नाही सापडलेत. फक्त बेळगावला 1860 मध्येे रॉबर्त ब्रूस फूट ह्या भूगर्भ अभ्यासकाला गेंड्याचे जीवाष्म सापडल्याचे उल्लेख आहे. आता तसे पाहायला गेले तर मग कोकणात सापडलेली ही गेंडा, पाणघोडा ह्यांची चित्रेसुद्धा एवढीच जुनी आहेत का?
कोकणात ही चित्रे सापडली आहेत हे खरे. अगदी ती चित्रे ज्याने कोरली आहेत, जशी कोरली आहेत, त्यावरून वाटते की, ह्या प्राण्यांच्या सहवासात तो कलाकार असावा; पण ह्याच्या पल्याड पुरातत्त्वीयदृष्ट्या प्राथमिक म्हणता येतील असे पुरावे कोकणात अजून आढळलेले नाहीत. आता प्राथमिक पुरावे म्हणजे काय? तर ह्या चित्रांमध्ये असलेल्या प्राण्यांचे जीवाश्म किंवा उत्खननात त्यांची हाडे सापडणे जशी त्या मांजरा नदीच्या किनारी सापडली आहेत. तशा प्रकारचा पुरावा कोकणात सापडणे हे जवळपास अशक्य आहे. त्याचे कारण एकतर कोकण किनारपट्टीचे वातावरण आणि हा जांभा दगड हाच आहे. जरी प्राथमिक पुरावा नसला तरी ह्याच वातावरणाचा अभ्यास करून अन्य काही पुरावे समोर आले आहेत. अन्य पुरावे म्हणजे पुरा पर्यावरणाचा अभ्यास.
गेंडा, पाणघोडा, हत्ती, इतर हरीण वर्गातील प्राणी ह्यांची चित्रे आपल्याला कोकणात दिसतात म्हणजेच ते प्राणी कधी ना कधी तरी कोकणात अस्तित्वात होते. त्यांच्या अस्तित्वासाठी लागणारे वातावरण कसे असते? ते तेव्हा होते का? कसे होते? ह्या अभ्यासावर आमचा आता भर आहे. साधारणपणे ह्या मोठ्या प्राण्यांना आवडणारे वातावरण म्हणजे सदाहरित गवताळ भाग हवा असतो जिथे मुबलक प्रमाणात पाण्याचे साठे आहेत आणि तेही छोट्या छोट्या आकाराचे असे. आता सद्यःस्थितीला आपण कोकणात पाहायला गेलो तर हे असे वातावरण दिसत नाही. जेवढा पाऊस इथे पावसाळ्यात पडतो तेवढाच उकाडा हा उन्हाळ्यात असतो; परंतु तेव्हा म्हणजेच जेव्हा हे प्राणी अस्तित्वात होते तेव्हा असे वातावरण नसावे असे वाटते. आता पुरातत्त्वाचा अभ्यास करताना प्राचीन पर्यावरणाची पुनर्बांधणी हा एक फार महत्त्वाचा भाग असतो. त्याचा वापर आम्ही इथे करतो आहोत. 2012 च्या आसपास पुण्यातील आगरकर संस्थेतल्या काही अभ्यासकांना कांगवाई ह्या दापोली तालुक्यातील गावात एका विहिरीचे खोदकाम चालू असताना एका पानाचे जीवाष्म आढळून आले. जीवाश्म ह्यांचा कालखंड विविध तांत्रिक पद्धतीने काढता येतो. त्याचा कालखंड के. पी. कुमारन, शरद राजगुरू ह्या अभ्यासकांनी साधारणपणे 44000 वर्षे ते 20000 वर्षे एवढा जुना काढला. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पानाचे हे जीवाष्म आहे ते पान किंवा ती वनस्पती साधारणपणे अशा ठिकाणी सापडते जेथे तलाव किंवा छोट्या छोट्या आकारांचे पाणीसाठे आहेत. आता ह्याच प्रकारचे वातावरण आपल्या हत्ती आणि गेंडा यांसारख्या मोठ्या जीवांच्या आवडीचे आहे. सोबतच मघाशी वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला जी काही दगडी हत्यारे मिळाली आहेत तीसुद्धा ह्याच कालखंडाशी मिळत्याजुळत्या कालखंडातील आहेत. तदनंंतर मात्र वातावरणात अनेक बदल झाले असावेत असे वाटते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा ह्यांचे माजी संचालक राजीव निगम ह्यांनी नंतर समुद्राच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास केला आणि अंदाज बांधला की, आताची समुद्राची पातळी ही साधारणपणे इसवीसनपूर्व 2000 च्या आसपास स्थिरावली आहे. तत्पूर्वी ती सतत कमीजास्त होत होती. ज्या कालखंडाचा आपण विचार करतो आहोत त्या कालखंडात समुद्राची पातळी खूप मागे म्हणजेच आत असावी. त्यामुळे माणसाला आणि प्राण्यांना वावरायला जागासुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी. त्यानंतर समुद्राच्या पाण्यात झालेली वाढ मात्र त्या वेळचे अनेक पुरावे आपल्यासोबत खोल समुद्रात घेऊन गेली आहे. सिंधुदुर्गात मालवण भागात पुन्हा एकदा आगरकर संस्थेच्या कुमारन सरांना अशाच काहीखारफुटी वनस्पतीवर लागणार्या बुरशीचे जीवाश्म मिळाले आहेत अशा ठिकाणी जिथे आता खारफुटीची झाडे दिसत नाहीत. ह्याचा अर्थ समुद्र बर्यापैकी आत गेला आहे. त्याचा कालखंड हा साधारणपणे इसवीसनपूर्व 12000-10000 आहे. ह्याचे कालखंडाशी समांतर जाणारे पुरावे जळगाव तालुक्यातील पटणे गावातून येतात. प्रा. साळी ह्यांना तेथे उत्खननात शहामृगाच्या अंड्यांचे तुकडे आढळून आले. आता शहामृगसुद्धा कोणे एके काळी महाराष्ट्रात होते आणि त्याला लागणारे पर्यावरण मात्र गेंडा आणि हत्ती ह्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळे असते. तसाच काहीसा प्रकार इकडे एका चित्रात दिसून येणार्या एलीफंट बर्ड ह्या पक्ष्याचा. हा पक्षी जगातून नाहीसा होऊन 5000 वर्षे उलटली. मादागास्कर आणि आजूबाजूच्या परिसरांत सापडणारा हा उडता न येणारा पक्षी गवताळ प्रदेशात रमणारा. शहामृगापेक्षा जवळपास दोनेएक फूट उंच आणि पायात प्रचंड ताकद असणारा हा पक्षी भारतात होता ह्याचे पुरावे अजून सापडले नाहीयेत; पण कोकणात एक आकृती आहे जी 13 फूट उंच आहे आणि ह्या एलीफंट बर्डच्या शारीरिक रचनेशी मेळ खाणारी अशी आहे.
Katal Shilp Konkan
कोकणात सड्यावर फिरताना नैसर्गिकरीत्या तयार झालेली अनेक छोटीमोठी तळी आता आम्ही अभ्यासत आहोत. त्यात काही जुन्या मातीचे किंवा वनस्पतीजन्य जीवांचे किंवा पानांचे अवशेषमिळतात का ह्याचा शोध घेणे चालू आहे; परंतु हा एवढा मोठा विषय अभ्यासायचा म्हणजे काही सोप्पे काम नव्हे. गोष्टी शोधायच्या, गोळा करायच्या, मग त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढायचा, ही खूप लांबलचक, मोठी आणि थकवणारी प्रोसेस आहे. सोबतच कातळचित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. प्रत्येक नवीन साइटवरून नवीन माहिती समोर येते आहे. कर्नाटक,केरळमधूनसुद्धा आता चित्रे समोर येत आहेत. तिथे मात्र कुठेही गेंडा किंवा हत्ती ह्यांचे चित्रण दिसत नाही. त्यामुळे वातावरणातले बदल हे फक्त महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीपुरते मर्यादित होते, की पूर्ण पश्चिम किनारपट्टी त्यातून गेली होती ह्यावर अभ्यास चालू आहे. प्राचीन काळात माणूस हा नैसर्गिक बदलांसाठीचा मूलस्रोत नव्हता. निसर्गात नैसर्गिक पद्धतीने होणारे बदल हे सावकाश होत असत आणि त्याच वेगाने तो माणूस ते बदल आत्मसात करून त्यानुसार आपली जीवनशैली आखत होता. त्यामुळे संतुलन व्यवस्थित राखले जात होते. नंतरच्या कालखंडात माणसाने प्रगती केली आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन त्याला ओरबाडायला सुरुवात केली. होणारे बदल स्वीकार करायलासुद्धा माणसाला वेळ मिळेनासा झाला आहे. नैसर्गिक संसाधनांचा अयोग्य वापर करून माणूस आपली प्रगती साधत आहे जी पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक आहे. पुरातत्त्वाचा अभ्यास करताना अशा अनेक गोष्टी समोर येतात आणि भूतकाळ आपल्याला काय काय देऊन गेला आहे ह्याची जाणीव होते, सोबतच आपण आता वर्तमानातून काय काय हरवून बसत आहोत आणि भविष्यात काय काय दवडणार आहोत ह्याची जाणीव करून देतो. शेवटी आपण जे काही करतो ते आपल्या भविष्यासाठी; पण तेच जर आता आपण चुकीच्या पद्धतीने करत असू तर त्यावर वेळीच निर्बंध घालायला हवेत एवढे नक्की.
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात कातळशिल्पाच्या माध्यमातून अश्मयुगीन पाऊल खुनांचा ठोस पुरावा आढळू लागला आहे. मालवणनंतर आता देवगड तालुक्यातील साळशी गावच्या माळावर कातळशिल्प आढळून आले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या साळशी गावच्या महत्त्वामध्ये त्यामुळे आणखीनच भर पडली आहे.
सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प
प्रागैतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स या नावाने ओळखले जाते. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. कोकण भागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.
पावणाई देवीचे मंदिर ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान
साळशी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. हे गाव आदिलशाहीपासून तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. स्वराज्यात सामील झाल्यानंतर या गावाचा दबदबा आणखीनच वाढला. याठिकाणचे पावणाई देवीचे मंदिर हे ८३ खेड्यांचे अधिपती असलेले देवस्थान म्हणून ओळखले जाते. मंदिराची भव्यदिव्यता इतिहासाच्या पार्श्वभूमीची साक्ष देतात. याशिवाय अनेक अशा ऐतिहासिक पाऊलखुणा या भागात सापडतात.
कोळोशी गावात काही वर्षांपूर्वी एक गुहा सापडली
याच साळशीच्या माळावर आता आदिमानवाच्या पाऊल खुणांची साक्ष देणारे कातळशिल्प सापडले आहे. विशेष म्हणजे साळशीला लागून असलेल्या कोळोशी गावात काही वर्षांपूर्वी एक गुहा सापडली. या गुहेबाबत संशोधन झाले. या ठिकाणी आदिमानवाची वस्ती असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे साळशीत सापडलेल्या या कातळशिल्पामुळे येथील संशोधनाला नवा दुवा मिळाला आहे. विशेष म्हणजे याच शिल्पाच्या बाजूला काही अंतरावर भलीमोठी कातळात कोरलेली गुहादेखील आहे. अनेकवेळा जनावर पडून मृत झाल्याने स्थानिक गुराख्यांनी माती दगड टाकून काही प्रमाणात ही गुहा बुजवली आहे.
हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो
यावेळी बोलताना येथील तरुण निसर्गप्रेमी अभ्यासक संतोष गावकर म्हणाले कि, या कातळशिल्पाच्या बाबतीत आम्ही तज्ञ मार्गदर्शकांशी संपर्क साधला आहे. या शिल्पाचा अभ्यास सुरू असून लवकरच आम्ही याबाबतीत ठोस माहिती लोकांसमोर आणू. तर स्थानिक नागरिक असलेले प्रणव नाडनकर म्हणाले, आमच्याकडे जैन संस्कृतीच्या पाऊल खुणाही सापडतात. आमच्याकडे हा अश्मयुगीन ठेवा असू शकतो, असे वाटत होते. कारण अन्य भागात कातळशिल्प सापडत असताना आपल्याकडेही ती असतील असा आमचा अंदाज होता. आता हे कातळशिल्प सापडल्याने या भागातील नवा ठेवा समोर आला आहे. कोकणाचा उल्लेख पुराणातही सापडतो. सप्तपाताळातील कोकण हे एक पातळ म्हणून ओळखले जाते. या पाताळात आणखीन काय-काय दडले आहे, ते या शिल्पांच्या संशोधनातून समोर येऊ शकते.
marathisrushti.com
कोकणातील कातळशिल्पे – Marathisrushti Articles
11–14 minutes
मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला असणारा अरबी समुद्र आणि पूर्वेकडचा सह्याद्री पर्वत ह्या दोघांच्या मध्ये असणारा भाग हा कोंकण म्हणून ओळखला जातो. हीच महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टी ही निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक आणि खाद्यासंस्कृतीने संपन्न अशी आहे. एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या भागात असणारे नितळ समुद्र किनारे, जंगलं, मंदिरे आणि इतर अनेक गोष्टींसोबतच ह्या भागाचा इतिहास सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. ऐतिहासिक कालखंडाबाबतचे विविध पुरावे आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याच्या आधी बांधले गेलेले अनेक किल्ले जसे की सिंधुदुर्ग, मुरुड-जंजिरा, सुवर्णदुर्ग, पूर्णगड इत्यादी आणि त्याच्याही आधी बांधल्या गेलेल्या विविध लेणी ज्या साधारणपणे इसवी सनाच्या तिसऱ्या ते 7-8 व्या शतकापर्यंत अशा स्वरूपात दिसतात. परंतु त्याच्या आधीच्या कालखंडाचे कोणतेच पुरावे मोठ्या प्रमाणावर समोर आले नव्हते. पुरातत्त्वीय भाषेत त्याला dark age असे म्हणतात.
भौगोलिकदृष्ट्या जरी हा प्रदेश एक सारखा दिसत असला तरी भूशास्त्रीय जडणघडणीनुसार या भागाचे अजून 3-4 विभाग करता येतात. उत्तर कोकणातील ठाणे, रायगड जिल्हा ह्या भागाचा भूप्रदेश मुख्यतः बेसाल्ट दगडाचा म्हणजेच काळ्या पाषाणाचा आहे आणि दक्षिण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांमधील भूप्रदेश हा मुख्यत्वे जांभ्या दगडाचा असून त्याचा विस्तार अगदी महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गोवा, कारवार करत केरळपर्यंत दिसतो. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड प्रामुख्याने दक्षिण कोकणात किनाऱ्या जवळच्या पठारांच्या माथ्यावर आढळून येतो. ह्या जांभ्या दगडाच्या कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत ‘सडा’ असे म्हणतात. तर ही सगळी प्रस्तावना द्यायचे मूळ कारण म्हणजे हा जांभा दगड ज्याला भूगर्भीय भाषेत laterite असे म्हणतात तो गेली अनेक वर्ष पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाची अशी अश्मयुगीन अनेक रहस्य दडवून बसला आहे.
अश्मयुगात शिकार करून पोट भरणारा माणूस हळूहळू एके ठिकाणी राहून साधारणपणे आतापासून 12,000 वर्षांपूर्वी स्थिर जीवन जगू लागला होता. शिकार करण्यासाठी त्याच्याकडे असणारी दगडी हत्यारे आता जास्त विकसित झाल्यामुळे शिकार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ खूप कमी झाला होता त्या उरलेल्या वेळेचा वापर त्याने व्यक्त होण्यासाठी केला म्हणजेच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, तो बघत असलेले प्राणी, त्याचं स्वतःच जीवन याबाबतच्या गोष्टी तो चित्र रूपात दगडी भिंतींवर अथवा जमिनीवर कोरून किंवा रंगवून काढू लागला होता. ह्या कलेच्या प्रकाराला पुरातत्वशास्त्राच्या भाषेत Rock art किंवा भित्ती चित्र/ खोदचित्र असे म्हटले जाते. रंगवलेल्या चित्रांना pictogtraph आणि खरवडून काढलेल्या चित्रांना petroglyph असे म्हटले जाते. कलेच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा टप्पा गणला जातो. ही अशा प्रकारची चित्र जगभरात अंटार्क्टिका खंड सोडल्यास सगळीकडे सापडतात.
गेल्या काही वर्षात कोकणात अशा प्रकारच्या जमिनीवर निर्माण केलेल्या गूढ आणि अगम्य अशा खोदचित्ररचना हजारोंच्या संख्येने आढळून येत आहेत स्थानिक भाषेत त्याला ‘कातळ खोदशिल्प’ असे म्हटले जाते. मानवी उत्क्रांतीच्या एका विशिष्ट टप्प्यातील कालखंडावर प्रकाश टाकणाऱ्या अत्यंत बहुमोल अशा या खोदचित्र रचनांमध्ये लहान आकारच्या खळग्यापासून अगदी चौकोन त्रिकोण आणि अनेक गूढ अगम्य अशा प्राण्यांच्या पक्ष्यांच्या चित्ररचनांचा समावेश होतो. परंतु कोकणातल्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने प्रचंड मोठी आहेत, आणि आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जवळपास 350 किलोमीटर एवढ्या प्रदेशात, विविध ठिकाणी पसरलेली आहेत. ह्या चित्रांमध्ये एक शिंगी गेंडा, हत्ती, वाघ, पाणघोडा, सोबतच अनेक पक्ष्यांची चित्रेसुद्धा कोरून ठेवली आहेत जे आता कोकणात अस्तित्वात नाहीत. ह्या चित्रांचा कालखंड सांगणे फारच अवघड आहे त्याच्या दृष्टीने सुद्धा संशोधन चालू आहे. गेल्या शतकात साधारणपणे 1990 च्या आसपास रत्नागिरी गणपतीपुळे ह्या रस्त्याच्या रुंदीकरण कामाच्या वेळी पहिल्यांदा एक चित्ररचना लोकांच्या नजरे समोर आली, त्यानंतर पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातील अभ्यासक डॉ. श्रीकांत प्रधान, प्रा. गोगटे आणि डॉ. प्रबोध शिरवळकर ह्यांनी काही नवीन ठिकाणे शोधून काढली आणि तो अभ्यास जगासमोर मांडला. डॉ. अनिता राणे, डॉ. दाउद दळवी, प्रा. प्र .के. घाणेकर, डॉ. रवींद्र लाड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवासी असणारे श्री. सतीश लळीत ह्यांनी काही नवीन ठिकाणी संशोधन केले. कातळ शिल्पांचा शोध आणि संरक्षणाबाबत महत्त्वाचे काम केले ते म्हणजे रत्नागिरी येथे असलेल्या ‘निसर्गयात्री संस्थे‘च्या सदस्यांनी म्हणजेच सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई ह्या त्रयीने. 2014 सालापासून ह्यांनी कातळशिल्पांच्या शोधाबरोबर त्याचे पुरातत्वीय महत्त्व स्थानिक लोकात पटवून दिले आणि संरक्षणाचे काम ही हाती घेतले. 2017 सालापासून ह्या अगम्य ठेव्याला कायदेशीर संरक्षण मिळावे म्हणून पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय, महाराष्ट्र शासनसुद्धा कामी लागले आहे. निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी आणि महाराष्ट्र शासन आता एकत्रित ह्या गूढ आणि अगम्य विषयावर संशोधनात्मक आणि संरक्षणाचे काम करीत आहेत. ह्या उत्साही अभ्यासकांनी विभागाच्या सोबतीत आतापर्यंत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72 गावात 102 ठिकाणी जवळपास 1500 हून जास्त शिल्परचना शोधून काढल्या आहेत ही सर्व कातळशिल्प महत्त्वाची असून त्याची महसूलविषयक कागदपत्रांची पूर्तता करून ती राज्य संरक्षित स्मारके म्हणून घोषित करावीत यासाठीचे प्रयत्न चालू आहेत.
मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. ह्याचा पाठपुरावा प्रथमत: राज्य पुरातत्त्व विभाग आणि मग केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण ह्यांच्यामार्फत झाला. पुढील काळात ह्यातील एखादी जरी जागा जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने घोषित केली तर त्याचा कोकणातल्या पर्यटनावर फार मोठा परिणाम होईल. भारतात एकूण पर्यटनापैकी जवळपास 50% पर्यटन हे ऐतिहासिक आणि वारसास्थळांच्या ठिकाणी केले जाते. कोकणात आधीच धार्मिक आणि निसर्ग पर्यटन मोठ्या प्रमाणावर चालू आहे सोबतीला ह्याची भर पडली तर स्थानिकांना रोजगार मिळेलच सोबत स्थानिक पदार्थ, चालीरिती परंपरा, जीवनशैली ह्यांची सुद्धा जपणूक होऊन आर्थिक प्राबल्य निर्माण होईल.
कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे. माणसाच्या उत्क्रांतीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर निर्माण झालेली कला आणि तिचा इतिहास आपल्याकडे दडून बसला आहे जो जगासमोर आणणे महत्त्वाचे आहे. त्याबाबत आम्ही पाऊलपुढे टाकले आहे. आता आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे काम पुढे न्यायचे आहे.
भारतात विशेषतः कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि देवगड तालुक्यात आणि तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास 50 ठिकाणी अशी कातळचित्रे आढळतात. रत्नागिरी, लांजा व राजापूर तालुक्यात 42 गावांमधून 850 कातळशिल्पे-चित्रे सापडली आहेत.
रत्नागिरी जिल्हा : जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी-गोवडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले इत्यादी. जिल्ह्यात 490हून अधिक कातळशिल्पे आढळतात.
राजापूर तालुका : देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे, शेंडे, कोतापूर, खानवली, देवीहतोळ, नाचण इत्यादी. राजापूर तालुक्यात 290 हून अधिक कातळ-शिल्पे आढळतात.
लांजा तालूका : भडे, हरुचे, रुण, खानावली, रावारी, लोवगण इत्यादी या तालुक्यात 70 हून अधिक कातळ-शिल्पे आढळतात.
देवगड तालुका : वाघोटन, बापर्डे.
गोवा : उसगाळीमळ, महाराष्ट्र-गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळ, कुडोपी.
सिंधुदुर्ग जिल्हा : सिंधुदुर्ग येथील शोधमोहीम सुरू असून देवगडमध्ये काही ठिकाणी सापडली आहेत. कुडोपी, वाघोटन आणि हिवाळे येथे कातळ-शिल्पे आढळून येतात. कोकणातील प्रामुख्याने कातळ सड्यांवर हे काम सुरू आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील समुद्र किनाऱ्यापासून पूर्व दिशेला 25 किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे 150 किलोमीटर अंतरात आणि 3700 चौरस किलोमीटर गावांमधील परिसरात कातळ चित्रे शोध संशोधन कार्य सुरु आहे. या कातळ शिल्प-चित्रांचा काळ मध्य अश्म युगीन म्हणजे इसवी सन पूर्व 10000 (दहा हजार वर्षे) असावा सिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे, रायगड या जिल्ह्यातील विविध ठिकाणी जांभा पाषाणावर चित्रे,नकाशे, काष्ठ शिल्पे, गुहा, लेणी, मंदिरे आढळून येतात.
चवा : मुंबई-गोवा महामार्गावरून गणपतीपुळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चवा गाव आहे. तेथील कातळशिल्पात तीन मानव आणि तीन प्राणी कोरण्यात आले आहेत. मानवाची धड विरहीत असून दोन्ही हात पसरलेले आहेत. दुसऱ्या मानवाच्या हातात फुलासारखा आकार दिसतो, तर तिसऱ्यात मानवाच्या बाजूला अस्वलासारखा प्राणी दिसतो.
दावूद : येथील चित्रात एकशिंगी गेंडा, हरिणाच्या कुळातील प्राणी, काही अनाकलनीय प्राणी आणि भौमितीय रचना आहेत. गेंड्याचा कान आणि शिंग उठून दिसतात. या चित्रात गेंड्याचे अस्तित्व विस्मयकारक आहे कारण हा प्राणी कोकणात आता आढळत नाही. या आकृतीचा आकार 4 मीटर बाय 3 मीटर आहे. काही प्राणी माकड व कोल्ह्यासारखे दिसतात.
जांभरुण : या ठिकाणी मात्र 25 मीटर बाय 25 मीटर क्षेत्रफळात जवळपास 50 आकृत्या कोरल्या आहेत. त्यापैकी 8 मानवाकृत्या तर इतर जलचर प्राणी आणि चतुष्पाद प्राण्यांचे आकार आहेत.
कोळंब : रत्नागिरी शहरापासून राजापूर सागरी मार्गावर 7 कि.मी. अंतरावर आहे. येथे 10 प्राणी आणि मानवाकृती आहेत. मानवाकृतीचा आकार मोठा असून इतर प्राणी प्राण्यांच्या प्रत्यक्ष आकाराएव्हढे आहेत. यातील हरणाची आकृती लक्षवेधी आहे. या हरणाला दुहेरी शिंगे, वळलेली शेपटी, उघडेतोंड इत्यादी बारकाव कोरलेले आहे.
कापडगांव : हे ठिकाण रत्नागिरीपासून 20 कि.मी. अंतरावर मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा गावाजवळ आहेत. इथल्या चित्र समूहात मानव, कासव, मानवी पावले आणि काही भौमितीय आकृत्या कोरलेल्या आहेत.
कशेळी : हे स्थळ थोडे दुर्गम भागात असून रत्नागिरी-राजापूर रस्त्यावर गावखडी-गावडेवाडी बसस्टॉप पासून पाऊल वाटेने जावे लागते. दोन्हीकडून हे 40 कि.मी. अंतरावर आहे. इथले शिल्प भारतातील सर्वात मोठे कातळ-शिल्प असावं. इथल्या हत्तीची आकृती 18 मीटर बाय 13 मीटर इतकी भव्य आहे. हत्तीच्या अकृतिबंधाच्या पोटात वाघ, माकड, शार्क, गेंडा, स्टिंगरे, पक्षी, मोर यांसारख्या 70/80 प्राणी व पक्षी यांच्या आकृत्या आहेत.
देवीहसोळ : येथे जाण्यासाठी पावस-आडिवरे मार्गे भूगावाकडून पुढे देवी हसोळला पोचता येते. येथील आर्यादुर्गा मंदिराजवळ कातळ-शिल्पे आहेत. इथली चित्रे खरोखरच अनाकलनीय आहेत कारण आयतामध्ये वेगवेगळ्या भौमितीय रचना असून त्या कुठलाही प्राणी, पक्षी किंवा मीनवी आकृत्या नाहीत.
बारसू : राजापूर-आडिवरे रस्त्यावर बारसू हे गाव आहे. रत्नागिरीपासून 60 कि.मी.वर असून इथे दोन वाघांच्या मध्ये माणूस उभा असल्याची रचना मानवाच्या खऱ्या आकारापेक्षा मोठ्या प्रमाणावर कोरलेली आहेत. माणसाच्या शेजारी मासा, ससा आणि मोर सुध्दा आहेत. माणसाच्या छातीवर योनी सदृश्य आकृती दिसून येते.
उक्षी : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंब्याजवळ उक्षी गावात 6 मीटर बाय 6 मीटर आकाराचे हत्तीचा कातळ शिल्प आहे. हत्ती हा अतिशय देखणा असून त्याचा भव्य कान, शेपूट, सोंड व पाय हे सर्व अवयव सुबकपणे कोरलेले आहेत.
प्रागैतिहासिक गूढ आकृत्या – निवळीफाटा निवळी फाट्यापासून गणपतीपुळ्याकडे जाताना साधारण 800 ते 900 मीटरवर डाव्या बाजूस नारळाची झाडे दिसतात त्या झाडांच्या समोर रस्त्याच्या उजव्या बाजूस जमीनीवर काळ्या कातळावर काही गूढ आकृत्या कोरलेल्या दिसतात. चौरस आकारातील ह्या आकृत्या नेमक्या कशाच्या आहेत, त्या केव्हा कोरल्या गेल्या, त्याचा उद्देश काय यावर काहीच संशोधन झालेले नाही. कोरलेल्या एकसारख्या वााकार रेषा, आयत, त्रिकोण, अर्धवर्तुळ, उभ्या-आडव्या पट्ट्या, अशा आकृ्त्या आपणाला संभ्रमात टाकतात. तसेच काही मीटर पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूस काळ्या कातळात खोदलेली विहीर आहे. तिला पायऱ्या खोदलेल्या असून त्याची रचना, वैशिष्ट्यपूर्ण आकार पाहाण्याजोगा आहे.
राजापूरच्या कातळावरही तब्बल 14 किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत. मासा, जलकुंभ, जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती आढळल्या आहेत. कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्पे हा आजही मोठे गूढ आहे. ह्या आकृत्या कोणी आणि कधी खोदल्या असाव्यात याची नेमकी कोणालाही कालगणना आजतरी उपलब्ध नाही. एप्रिल-मे महिन्यात कातळावरचे सर्व गवत वाळल्यावर त्यावरील संबंधित आकृत्या दिसतात. कोकणातील जांभा दगडाचा विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की, इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती कोरली गेली आहेत. कोकणातील आदिमानवाच्या अश्मयुगातील कालखंडातील ही कातळ-शिल्पे राज्य संरक्षित स्मारके होणार आहेत. आणि भविष्यात जागतिक पातळीवर संरक्षित वारसास्थळ म्हणून मान्यता पावतील. या अमोल कातळशिल्पामुळे कोकणच्या पर्यटनाला वेगळीच दिशा आणि भरीव चालना मिळेल. कातळशिल्पांसाठी राज्य सरकारने विशेष निधी मंजूर केला असून, त्या अंतर्गत त्यांच्या जतन संवर्धनाची योजना अंमलात येणार आहेत. कोकणवासीयांनी देखील या जागतिक स्तरावरच्या अमूल्य ठेव्याची जाण ठेवून त्याच्या संरक्षण करावे.
-ॠत्विज आपटे
(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
marathi.indiatimes.com
कातळशिल्पांचा प्राचीन वारसा
टीम मटा ऑनलाइन
8–11 minutes
-सतीश लळीत
दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या पंचवीस-तीस वर्षांत अनेक ठिकाणी आढळलेली कातळशिल्पे हा आता केवळ कुतुहलाचा विषय राहिलेला नसून तो अभ्यास आणि संशोधनाचा विषय झाला आहे. ६ मे २००१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हिवाळे येथील धनगरसड्यावरील कातळशिल्पे मी सर्वप्रथम उजेडात आणली, तेव्हापासून आतापर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ७५हून अधिक ठिकाणी सुमारे दोन हजार कातळशिल्पे आढळली आहेत. जनजागृतीमुळे अलीकडे कातळशिल्पांचा शोध लागण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीच्या अगदी उत्तर टोकाच्या मंडणगड तालुक्याच्या बोरखत गावातील ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव-तोंडवली गावातील कातळशिल्पांचा यावर्षीच्या मार्चमध्ये लागलेला शोध हे सर्वांत अलीकडील शोध आहेत आणि यात सतत भर पडत आहे.
प्राथमिक अंदाजानुसार ही कातळशिल्पे म्हणजे प्रागैतिहासिक काळात या प्रदेशात वावरलेल्या भटक्या-संकलक मानवी टोळ्यांच्या ( Pre-historic hunter gatherer human tribes ) पाऊलखुणा आहेत. कातळशिल्पे खोदण्याचा कालावधी इसवीसन पूर्व २५ हजार ते इसवीसन पूर्व दोन हजार वर्षे यादरम्यान (मध्याश्मयुग ते नवाश्मयुग) असू शकतो. कातळशिल्पांचा कालावधी, उद्देश, अर्थ याबाबत एकमत नसले तरी, ती प्रागैतिहासिक काळातील असावीत आणि मानवी कलेचा तो प्रथम आविष्कार आहे, यात मात्र शंका नाही. मार्च २०२२ मघ्ये ‘युनेस्को’ने नऊ कातळशिल्प ठिकाणांचा समावेश ‘जागतिक वारसा स्थळां’च्या तात्पुरत्या यादीत केल्यामुळे हा विषय जागतिक पटलावर आला. त्यापैकी एक असलेल्या बारसू येथील कातळशिल्पांच्या परिसरात होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधामुळे ही कातळशिल्पे राजकीय पटलावरही आली.
गेली २३ वर्षे मी सतत या विषयाचा अभ्यास करीत आहे आणि हिवाळेनंतर कुडोपी, खोटले, धामापूर येथील अनेक ठिकाणची कातळशिल्पे प्रकाशात आणली आहेत. कातळशिल्पांबाबत सविस्तर माहिती देणारे ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हे या विषयावरील पहिले पुस्तकही प्रकाशित केले आहे. कर्नाटक, राजस्थानसह अनेक ठिकाणच्या राष्ट्रीय पुरातत्त्व परिषदांमध्ये शोधनिबंध सादर करून, सातत्याने लेख लिहून हा विषय तज्ज्ञ आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या २३ वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिवाळेनंतर कुडोपी, खोटले, हेदूळ, धामापूर, ओवळिये, किर्लोस, आरे, खुडी, तळेबाजार, वानिवडे, वाघोटण, मुणगे, साळशी, नांदगावसह अनेक गावांमधील आणि रत्नागिरी जिल्ह्यातही सुमारे ५० गावांतील दीड हजारांहून अधिक कातळशिल्पे, विशेषत: हौशी अभ्यासकांनी उजेडात आणली. रत्नागिरीच्या ‘निसर्गयात्री’ संस्थेने रत्नागिरी येथे कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन या विषयावर आधारित कोकणातील पहिले ‘कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र’ ऑक्टोबर २०२३मध्ये सुरू केले. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, आयआयटीएम प्रवर्तित टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, आयआयटी मद्रास, आयआयटी हैदराबाद, जेएनयू दिल्ली यांच्या सहयोगाने हे केंद्र सुरू झाले आहे.
‘अज्ञाताच्या प्रांता’ची खिडकी किलकिली
कोकण प्रांताच्या प्रागैतिहासिक काळाबाबत फारसा अभ्यास झालेला नाही. याबाबतची साधनेही फार दुर्मिळ आहेत. इसवी सनाच्या आधी दोनतीन शतकांपासून कोकणच्या अनेक बंदरांमधून रोमसोबत व्यापार होत असल्याचे पुरावे आहेत. सुसरोंडी गुहा (पालशेत, गुहागर) आणि कोळोशी गुहा (नांदगाव, कणकवली) येथील उत्खननामध्ये कोकणातील पुराश्मयुगकालीन (सुसरोंडी - ९२ हजार वर्षे, कोळोशी - ५२ हजार वर्षे) मानवी वसाहतींचे प्राथमिक पुरावे सापडले आहेत. त्यानंतरच्या कालावधीत कोकण प्रदेशात मानवी संस्कृतीच्या पातळीवर काय घडामोडी होत्या, हे समजण्यास वाव नाही. म्हणून याला अज्ञाताचा प्रांत (डार्क एज) म्हटले जाते. परंतु, आता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील कातळशिल्पांच्या शोधामुळे एक पाऊल पुढे पडले आहे. याचा एकात्मिक, तुलनात्मक व व्यापक अभ्यास पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केला तरच या अज्ञाताच्या प्रांतावर प्रकाश पडू शकेल. याची सुरुवात मात्र झाली आहे. सुसरोंडी, कोळोशी गुहा आणि कातळशिल्पे या अत्यंत महत्त्वपूर्ण शोधांमुळे कोकणातील मानवी वसाहतींबाबत व पश्चिम किनारपट्टीवरील मानवी संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण दुवा मिळाला आहे आणि या ‘अज्ञाताच्या प्रांता’ची खिडकी किलकिली झाली आहे. कोकणातील मानवी संस्कृतीचा विकास आणि पुरातत्त्वशास्त्र या दृष्टीने ही कातळशिल्पे खूप महत्त्वाची आहेत.
कातळशिल्पे किंवा रॉक आर्ट हा जागतिक पातळीवरील विषय आहे. गुहांच्या भिंतींवर नैसर्गिक रंगांनी चितारलेली गुहाचित्रे (पिक्टोग्राफ) आणि दगडांवर कोरलेल्या किंवा खोदलेल्या आकृत्या (पेट्रोग्लिफ्स) जगाच्या अनेक भागात आढळतात. प्रागैतिहासिक काळातील मानवाची ही कलात्मक अभिव्यक्ती हा पुरातत्त्वज्ञांप्रमाणेच सर्वसामान्य माणसाच्या कुतुहलाचा विषय आहे.
अश्मयुगीन मानवाच्या कलेचा आविष्कार
कातळशिल्पांमधील कलाकृती कोणत्या कालावधीत कोरण्यात किंवा खोदण्यात आल्या, हा प्रश्न हमखास विचारला जातो. याचे निश्चित उत्तर देता येत नाही, पण याबाबत काही अंदाज लावण्यात आले आहेत. एक नक्की की, हे सर्व प्रागैतिहासिक काळात, अश्मयुगात घडले आहे. परंतु, अश्मयुगाचा कालावधी हा प्रदीर्घ आहे. आद्य पुराणाश्मयुगामध्ये, म्हणजे सुमारे २० लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेतील आदिमानवाने दगडी हत्यारे बनवल्याचे पुरावे आहेत. अश्मयुग जगाच्या विविध भागांत वेगवेगळ्या वेळी सुरू होते. त्यामुळे अश्मयुगाचा कालपट प्रदीर्घ आहे. जगभरात विविध ठिकाणी सापडलेल्या पाषाणकलेचा (गुहाचित्रे आणि कातळशिल्पे किंवा पाषाणशिल्पे) विचार केला तर साधारणत: २५ ते ३० हजार वर्षांपूर्वी म्हणजे मध्याश्मयुगात याची सुरुवात झाली असावी. मानवाची बुद्धी प्रगत होत गेली, तसतशी त्याने दगडी हत्यारांची निर्मिती, अग्नीचा वापर आणि नियंत्रण, निवारा, मृतांचे दफन, वस्ती, पशुपालन, मातीची भांडी, शेती असे प्रगतीचे एकएक टप्पे पार केले. याच दरम्यान त्याच्या अंगी कलावृत्तीचा जन्म झाला. हा सर्व प्रगतिक्रम लक्षात घेतला तर पाषाणकला ही इसवीसन पूर्व २५ हजार ते दोन हजार वर्षे या दरम्यानची आहे, असे म्हणता येईल. अर्थात हा केवळ अंदाज आहे.
दुसरा प्रश्न या कातळशिल्पांचा अर्थ काय? तसे पाहिले तर कातळशिल्पांचा अर्थ लावणे, अतिशय जटिल आहे. ही कातळशिल्पे खोदण्याचा अश्मयुगीन मानवाचा नेमका कोणता उद्देश होता, त्या चित्रांचा अर्थ काय, हे प्रश्न आजही बऱ्याचअंशी अनुत्तरित आहेत. गुहाचित्रांमधील प्राणी व त्यांच्या शिकारीच्या प्रसंगांची चित्रे किंवा कातळशिल्पांमधील प्राणी यांचा अर्थ काही प्रमाणात लागू शकतो. मेमरी ड्रॉइंग या चित्रकला पद्धतीनुसार त्याने हे पूर्वी पाहिलेले, अनुभवलेले चितारले किंवा खोदले. आपल्या पुढील पिढीला याची माहिती मिळावी, असाही त्याचा उद्देश असावा. मेंदूचा सतत होत असलेला विकास, सुचणाऱ्या संकल्पना, फावल्या वेळेचा सदुपयोग हे उद्देशही त्यामागे असतील. दुसरी एक शक्यता अशी की, या काळात ज्या भटक्या टोळ्या होत्या, त्या वेगवेगळ्या प्रदेशांत शिकारीनिमित्त फिरत. शिकारीवरून त्यांचा संघर्षही होत असणार. याकरिता विशिष्ट भूप्रदेशावरची आपली सत्ता सिद्ध करण्याचेही प्रयत्न त्याने केले असावेत. वन्यप्राणीही अशा प्रकारे आपल्या क्षेत्राच्या सीमा निश्चित करून घेतात. या सीमांच्या हद्दीत ते दुसऱ्या प्राण्याला येऊ देत नाहीत. एकाच ठिकाणी अशा प्रकारे सहज लक्ष वेधून घेतील, अशी चित्रे कोरून त्या टोळ्यांनी आपल्या हद्दी आखून घेतल्या असाव्यात, अशीही शक्यता आहे.
अनेक ठिकाणी आश्चर्यकारक अशा प्रमाणबद्ध भौमितिक अमूर्त रचना सापडल्या आहेत. अशा रचना कोरणारा मानव प्रगल्भ असला पाहिजे. बऱ्याचशा रचनांमध्ये चौकोन किंवा आयतांमध्ये आणखी काही चौकोन आखून त्यात नागमोडी रेषा खोदलेले शिल्पपट्ट आढळतात. गूढ नकाशांप्रमाणे या रचना भासतात. काही ठिकाणी वर्तुळे (circles), चक्री वर्तुळे (spirals), चक्रव्युह ( labirynths ) आढळून येतात. यांचा संबंध आकाशातील ग्रहतारे यांच्याशी किंवा खगोलांशी असावा का, हासुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
‘जागतिक वारसा स्थळां’च्या तात्पुरत्या यादीत
देशातील ‘जागतिक वारसा स्थळां’ची संख्या वाढविण्याच्या राज्य शासनाचा पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये विभाग आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांना मार्च २०२२ मध्ये मोठे यश मिळाले. केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावांना ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर'ने हिरवा कंदील दाखवला. या प्रस्तावांमध्ये ‘कोंकणातील कातळशिल्पां’चा समावेश असून सिंधुदुर्गातील कुडोपी, रत्नागिरी जिल्ह्यातील सात, तर गोव्यातील एका कातळशिल्प ठिकाणाचा यात समावेश आहे. ही ठिकाणे ‘युनेस्को’च्या प्रस्तावित यादीत समाविष्ट झाली आहेत. कोकणाच्या पर्यटन विकासाच्या व मानवी पुरातन वारसा जतनाच्यादृष्टीने ही अभूतपुर्व घटना आहे. ही ठिकाणे पुढीलप्रमाणे १) कुडोपी (सिंधुदुर्ग), २) उक्षी, ३) जांभरुण, ४) कशेळी, ५) रुंधेतळी, ६) देवीहसोळ, ७) बारसु, ८) देवाचे गोठणे (सर्व रत्नागिरी) आणि ९) पोन्साईमळ (गोवा). ही ठिकाणे ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून अंतिमरित्या जाहीर होण्यास अजून बरीच मोठी प्रक्रिया आणि अवकाश आहे; पण एक चांगली सुरुवात झाली आहे.
एकूणच कोकण प्रदेशातील मानवी संस्कृतीच्या विकासाचे धागेदोरे, प्राचीन मानवी वारसा, आदिम कला, पर्यटन विकासाची मोठी संधी अशा अनेक अंगांनी ही कातळशिल्पे खूप महत्त्वाची आहेत. ही सर्व कातळशिल्पे जांभ्या दगडाच्या पठारांवर आहेत. (ज्यांना कोकणात सडे म्हणतात.) आतापर्यंत दुर्लक्ष आणि अज्ञानामुळे अनेक कातळशिल्पे नष्ट झाली आहेत. या पठारांवरून बांधकामासाठी लागणारे दगड (चिरे) काढले जातात. या चिरेखाणींचा प्रचंड मोठा धोका कातळशिल्पांसमोर प्रश्नचिन्ह बनून उभा आहे. महत्वाच्या ठिकाणची कातळशिल्पे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून जाहीर करणे, हा वारसा जपण्यासाठी ग्रामपंचायतींना अर्थसहाय्य करणे, जनजागृती करणे, अभ्यासक्रमात शक्य तेथे या विषयाचा समोवश करणे, असे उपाय योजले तरच हा वारसा भावी पिढ्यासाठी शिल्लक राहील.
हे झाले तर कोकणच्या पर्यटनक्षेत्राला एक नवा आयाम मिळेल. या कातळशिल्पांचा अधिक शास्त्रशुद्ध अभ्यास झाला तर कोकणातील मानवी अस्तित्वाच्या प्रवासावर नवा प्रकाश पडू शकेल. पण यासाठी शासनस्तरावर आवश्यक असलेली राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती, स्थानिक जनतेचा सहभाग आणि रेटा निर्माण होऊन हे प्रत्यक्षात घडेल का, हा कळीचा प्रश्न आहे. या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत आशावादी राहायला हरकत नाही.
(लेखक हौशी पुरातत्त्व अभ्यासक व निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत.)
wikiwand.com
कातळ खोदशिल्प - Wikiwand
6–8 minutes
कातळ खोदशिल्प
प्रागैतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने दगडात विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art) किंवा पेट्रोग्लिफ्स (petroglyphs) या नावाने ओळखले जाते. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गूढ खोदचित्रे आहेत. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. [१]
Thumb
बारसू कातळशिल्प(३)
favicon
1 Sources
Thumb
बारसू कातळशिल्प(२)
महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.
भडे, हरचे, रुण, खानावली, रावारी, लावगण इ. देवगड आणि सिंधुदुर्ग येथील शोधमोहीम सुरू असून देवगडमध्ये काही ठिकाणे सापडली आहेत.[२]
देवगड तालुका-
वाघोटन ,बापर्डेत इ.
मालवण तालुका-
हिवळे
हिवाळे येथील कातळ खोदशिल्पे ६ मे २००१ रोजी हौशी पुरातत्व अभ्यासक सतीश लळीत ह्यांनी उजेडात आणली.मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[३]
favicon
2 Sources
कोकणातील प्रामुख्याने कातळ सड्यांवर हे काम सुरू आहे. रत्नागिरी,राजापूर,लांजा येथील समुद्र किना-यापासून पूर्व दिशेला २५ किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरात ३७०० चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील कातळ खोद शिल्पाचे संशोधनकार्य सुरू आहे.[२]
या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व १०००० वर्षे इतका असावा, असे अभ्यासक नोंदवतात.[२]
या सर्व रचना या कातळाच्या जमिनीवर पृष्ठभागावर आडव्या पद्धतीने कोरल्या गेल्या आहेत.
प्राण्यांच्या खोदलेल्या आकृती या प्रत्यक्षातील प्राण्यांच्या आकाराशी मिळत्या-जुळत्या आहेत.
पक्ष्यांच्या कोरलेल्या आकृती या प्रत्यक्षातील पक्ष्यांच्या आकारापेक्षा मोठ्या आकारात कोरलेल्या आहेत.
विशेषतः कोकणातील कातळ शिल्पातील प्राणी व पक्षी यांच्या आकृतींचा विचार करता भारतात अन्यत्र आढळून येणाऱ्या अशा शिल्पांच्या तुलनेत हे आकार मोठे आहेत.
ज्या प्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे कोकणात आढळून येत नाहीत अशा प्राण्यांच्या आकृतीही यात कोरलेल्या आहेत, उदा. एकशिंगी गेंडा, पाणघोडा, इ.
येथील चित्रशैली पोर्तुगाल,ओस्ट्रेलिया येथील शिल्पांशी प्रथमदर्शनी साम्य दाखविते.[२]
एका प्रकारच्या या शिल्पांसाठी कातळावर ठराविक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत.
दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे व मासा, कासव, असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती, व सांकेतिक खुणा दिसतात. काही ठिकाणी भौमितिक रचनाही आढळतात. देवाचे गोठणे गावातील शिल्पात सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प आहे.
प्राणी- चिन्ह स्वरूपात प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसतात. शिल्परचनेतील प्राणी आणि मूळ प्राणी यांच्या आकारात साम्य आढळते.
पक्षी- शिल्परचनेत पक्षी असण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मूळ पक्ष्यांच्या आकारात आणि शिल्पातील पक्ष्यांच्या आकारात फरक दिसून येतो.
जलचर आणि उभयचर प्राणी- प्रतिमा व मूळ आकार यांच्यात या शिल्पाकृतीत सारखेपणा दिसून येतो. समुद्री कासव, मगर, विविध प्रकारचे मासे यांची शिल्पे कोरलेली दिसून येतात.
मनुष्याकृती- या रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणाऱ्या नसल्या तरी हे चित्रण सादृश्य (?) आहे असे दिसून येते. या प्रतिमा स्त्रीच्या आहेत की पुरुषाच्या आहेत हे कळण्याच्या दृष्टीने त्यावर कोणत्याही खुणा आढळत नाहीत.
गोपद्म/भौमितिक रचना- यांच्या आकारात विविधता असून या चिह्नांकित रेखाकृती या स्वरूपात कोरलेल्या दिसतात.
मातृदेवता- गुडघ्यापासून खाली मानवी पायाच्या रचनेतून कोरलेली अशा प्रकारची शिल्पे काही चित्रे आहेत. या रचना पाहता त्या मातृदेवता असाव्यात का यावर अभ्यासक संशोधन करीत आहेत.[२]
राजापूर, रत्नागिरी व लांजा तालुक्यात ४२ गावांमधून ८५० कातळशिल्पे सापडली आहेत. राजापूरजवळच्या गोवळ या गावातही मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील कातळशिल्पे आहेत. शोधकर्ते सुरेंद्र ठाकुरदेसाई, धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड या शोधकर्त्यांनी चार वर्षापासून ही मोहीम सुरू केली आहे. कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी शासनाकडून प्रथमच निधी मंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकऱ्यांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम केले जाते.[४]
favicon
1 Sources
या शिल्पाकृती समाजाला माहिती व्हाव्यात पण त्याच जोडीने त्यांचे रक्षणही व्हावे यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये यांच्या सहली किंवा विविध दूरचित्रवणी माध्यमातून या ऐतिहासिक वारशाची माहिती पोचविले जात आहे. यासाठी पुरातत्त्व खात्यालाही सहकार्य करण्यात येते आहे.
जगाच्या विविध भागांत आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. जगात ‘रॉक आर्ट’ म्हणून ती ओळखली जातात. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे हा ‘रॉक आर्ट’चाच प्रकार आहे.[५]
favicon
1 Sources
मार्च २०२२ मध्ये युनेस्कोने नऊ कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत केल्यानंतर कातळ शिल्प हा विषय जागतिक पटलावर आला आहे.[६]
favicon
1 Sources
कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या १७व्या राष्ट्रीय परिषदेत सोसायटीचे सदस्य असलेल्या सतीश लळीत यांनी कुडोपी येथील कातळशिल्पांबाबतचा शोधनिबंध सादर केला. त्यात मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांची सविस्तर माहिती छायाचित्रांसह सादर करण्यात आली. कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्माण झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. या कलात्मक संस्कृतीची निश्चित कालगणनाही अद्याप झालेली नाही. तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कोणत्या हेतूने निर्माण झाली आणि कोणी केली, याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. त्यातून कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारख्या पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी या भागातील आदिम मानवी समूहाची वसतिस्थाने यांच्याबद्दल माहिती मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यासाठी या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षण होणे, हाती येणाऱ्या माहितीचा सयुक्तिक अर्थ लावणे, या कातळशिल्पांचा कालावधी निश्चित करणे इत्यादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.[७] कातळशिल्पांचा अभ्यास हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करणे पुरेसे नसते. त्या संशोधनासाठी पूरक म्हणून भौगोलिक बदल, पर्यावरणीय बदल, जैवविविधता यांचाही अभ्यास करणे आवश्यक असते.
favicon
1 Sources
Thumb
भीमबेटका गुहाचित्रे
Thumb
देवाचे गोठणे कातळशिल्पाचा चुंबकीय परिणाम
Thumb
परदेशातील कातळशिल्प
Thumb
बारसू कातळशिल्प (७)
Thumb
बारसू कातळशिल्प
Thumb
बारसू कातळशिल्प (५)
kokanmedia.in
पूर्वजांच्या पाषाणखुणांच्या शोधाची गोष्ट : कोकणातील कातळ-खोद-चित्रे - साप्ताहिक कोकण मीडिया
Kokan Media
43–55 minutes
गेल्या चार-पाच वर्षांत कोकणातील अनेक ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण खजिन्याचा शोध लागला आहे. तो खजिना म्हणजेच कातळ-खोद-चित्रे किंवा कातळशिल्पे. हा १० हजार वर्षांपूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा मोठा खजिना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली, मिळालेली दगडी हत्यारे याच्या आधारे भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. पूर्वजांच्या पाषाणखुणा असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण गूढ रचनांचा शोध कसा लागत गेला, कोणत्या संकेतांच्या आधारे स्थानिक अभ्यासक वेगवेगळ्या रचनांपर्यंत पोहोचले, त्याच्याशी जोडलेल्या आख्यायिका कोणत्या आहेत, या ठेव्याच्या संरक्षणासाठी काय केले जात आहे, या गोष्टींबद्दल अनेकांना कुतुहल आहे. हे शोधकार्य ज्या स्थानिक अभ्यासकांनी कुतुहलाने केले आणि हा ठेवा जगासमोर आणला, ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनीच मांडलेला हा शोधकार्याचा गूढरम्य प्रवास…
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकातील लेख)
………………
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू गावाच्या सड्यावर धनगर समाजातील सुमारे ८० वर्षांच्या वृद्ध व्यक्तीबरोबर गप्पा सुरू असताना सड्याच्या दुसऱ्या टोकाला निर्देश करून ‘असे काहीतरी आहे’ असे त्या व्यक्तीने सांगितले आणि जवळपास दीड-दोन वर्षे अंधारात चालू असलेल्या आमच्या कातळ-खोद-चित्र शोधाच्या प्रवासाला आणि मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील ज्ञानाचा एक मोठा खजिना समोर आणण्यासाठी खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.
अशा प्रकारच्या चित्ररचनांकडे मानवाच्या कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून पाहिले जाते. मानवी जीवनाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जगाच्या सर्वच भागांत पेट्रोग्लिफ्सची निर्मिती करण्यात आली आहे. सामान्यतः ही कला गुहेच्या भिंतींवर, उभ्या पाषाणाच्या बाजूंवर कोरलेली आहेत. परंतु कोकणात आढळणाऱ्या या कलेचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण म्हणजे इथे आढळणाऱ्या चित्ररचना तत्कालीन मानवाने उघड्या आकाशाच्या छताखाली कातळ सड्याच्या पृष्ठभागावर आडव्या स्वरूपात कोरल्या आहेत.
कोकणातील किनाऱ्याजवळच्या जांभ्या खडकांच्या खुज्या/कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत सडा असे म्हणतात. जांभ्या खडकाच्या सच्छिद्रतेमुळे या पठारांची पाणी धारण करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या सड्यांवर खुरट्या वनस्पती, पावसाळ्यानंतर उगवणारे गवत या व्यतिरिक्त वृक्षराई फारच अभावाने आढळते. या कारणांनी या पठारांवर आजही फारशी मनुष्यवस्ती आढळत नाही. अशा या सड्यांवर अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणा म्हणजे कातळ-खोद-चित्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कातळ सड्यांवर कोरून निर्माण केलेल्या द्विमितीय चित्रांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लिफ्स असे म्हणतात. प्रस्तुत लेख आहे तो या कातळ-खोद-चित्रांच्या शोध प्रवासाचा आणि त्यात आलेल्या अनुभवांचा.
या कातळ-खोद-चित्रांचा शोध हा खरे तर आमच्या ‘आडवळणावरचे कोकण’ या संकल्पनेतील एक भाग. कोकणभूमीची निर्मिती श्री विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांनी केली, असे उल्लेख प्राचीन साहित्यातून आपल्यासमोर येतात. भगवान परशुरामांच्या आईचे- रेणुकेचे नाव कुंकणा असे होते. त्यावरून या भूभागाला कोकण असे नाव पडले, असे उल्लेख पुराणातून येतात. अपरान्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाला इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकापासून कोकण या नावाने ओळखले जाते. अपर या शब्दाचा अर्थ पश्चिम असाही आहे. पश्चिमेच्या शेवटच्या टोकाचा (अन्त) प्रदेश म्हणजे अपरान्त. आजपर्यंत आपण कोकणाचा हा इतिहास शिकत, ऐकत आलो आहोत. परंतु अलीकडे आढळून येत असलेल्या कातळ-खोद-चित्रांमुळे कदाचित कोकणाचा इतिहास नव्याने लिहावा लागेल.
आज ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे म्हणजेच कोकण म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या सह्याद्री आणि अथांग महासागर यामधील चिंचोळी पट्टी म्हणजे कोकण. डहाणू ते महाड या भागाला उत्तर कोकण, तर कशेडी घाटापासून सिंधुदुर्गातील तेरेखोलच्या खाडीपर्यंतच्या भागाला दक्षिण कोकण म्हणून ओळखले जाते. हवामानदृष्ट्या हा प्रदेश सारखाच असला, तरी उत्तर कोकण व दक्षिण कोकण हे प्रदेश भू-शास्त्रीयदृष्ट्या भिन्न व्यक्तिमत्त्व असलेले प्रदेश आहेत. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड हा प्रामुख्याने दक्षिण कोकणात आढळून येतो. दक्षिण कोकणाचा हा जांभ्या दगडाचा भूप्रदेश आपल्या अंगा-खांद्यावर, पोटात अनेक रहस्ये घेऊन बसला आहे. त्याचबरोबर हा प्रदेश वैविध्यपूर्ण बाबी, जैवविविधता आणि संस्कृतीच्या विविध अंगांनी ओतप्रोत भरलेला आहे. खरे सांगायचे झाले, तर उभ्या महाराष्ट्रात कोकणासारखा प्रदेश नाही. परंतु ठराविक ठिकाणे, गोष्टी या पलीकडचा कोकण प्रदेश आम्हा कोकणातील लोकांनाच माहिती नाही. निसर्गप्रेमातून आमची भटकंती सुरू झाली आणि या बाबी आमच्या समोर येऊ लागल्या. त्यातूनच जन्माला आली, ती ‘आडवळणावरचे कोकण’ ही संकल्पना.
निवळी येथील कातळ-खोद-चित्रे. (लेखात सर्वांत आधी दिलेला फोटो उक्षीच्या कातळ-खोद-चित्राचा.)
कातळ-खोद-चित्रांच्या शोधप्रवासाला सुरुवात केली, त्या वेळी या विषयातील कोणतेही ज्ञान आम्हाला नव्हते. डोळ्यासमोर होत्या त्या निवळी, देवीहसोळ येथील एक-दोन चित्ररचना. काहीतरी पुरातन आहे, एवढाच काय तो आमचा या चित्रांशी संबंध. प्रा. प्र. के. घाणेकर यांच्या भेटीत या चित्रांचे महत्त्व समजले. आणि ती चित्रे मनावर कोठे तरी कोरली गेली होती.
बारसूच्या सड्यावर भेटलेल्या व्यक्तीने आमच्या चौकशीतील निसटत असलेली कडी गुंफून दिली. त्या भल्याथोरल्या सड्यावर निव्वळ अंगुलीनिर्देशानुसार मिळालेल्या माहितीवरून संबंधित ठिकाण शोधणे म्हणजे एक आव्हानच होते. तुटपुंज्या माहितीच्या जोरावर, दिशादर्शनातून मिळालेल्या ठिकाणी पोहोचलो. हे ठिकाण म्हणजे राजापूर तालुक्यातील गोवळ गावाचा सडा. गावातून सड्यावर येण्यासाठी असलेली पाखाडी. पाखाडी चढताना आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत सड्यावर पाऊल टाकले. नकळतच ‘अरे बापरे’ हे शब्द बाहेर पडले. एवढ्या मोठ्या सड्यावर शोधणार कसे? मिळालेल्या भौगोलिक माहितीच्या आधारे नजरेसमोर एक भासमान क्षेत्र उभे केले. अर्थात त्यासाठी आपल्याला बोलीभाषेतील शब्द, खुणा यांची थोडीफार तरी जाण असावी लागते. ‘हे फडे तिकडे सातवीण त्या अंगाला खरी’ करत प्रत्येक पावलागणिक पायाखाली पाहत मार्गक्रमणा सुरू झाली. थोड्या वेळात ‘इथे काही तरी आहे’ असे शब्दोच्चार झाले. अगदी पुसटपणे दिसत असलेल्या चित्रांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही याची काळजी घेऊन साफसफाई सुरू केली. काम करता करता ‘अरे इथे पण आहे, तिकडे पण,’ असे करत करत तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह समोर आला. या चित्ररचनांमध्ये प्राणी, पक्षी, अनाकलनीय अशा भौमितिक रचना यांचा समावेश होता. प्रत्यक्ष शोधाच्या पहिल्याच पावलावर मिळालेले हे यश आम्हाला आनंद देऊन गेले. हे काम करत असताना त्या वेळचे वातावरण मात्र असह्य करणारे होते. वातावरणातील हा फरक आम्हाला लक्षात येत नव्हता. शक्य तेवढ्या लवकर काम आटोपून तिथून परत फिरण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुक्कामी परतेपर्यंत एका मोठ्या वादळी पावसाने आम्हाला गाठले आणि वातावरणात झालेल्या फेरबदलाचे कारणदेखील समजले. एका वेगळ्या विषयातील आमचा प्रवेश, सोबत निसर्गातील वेगवेगळे अनुभव यांची व्याप्ती पुढे खूप मोठ्या प्रमाणावर जाईल, याची आम्हाला त्या वेळी कल्पना नव्हती.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला परिचित असलेले प्र. के. घाणेकर, डेक्कन महाविद्यालयाचे डॉ. सचिन जोशी व रवींद्र लाड या तज्ज्ञ व्यक्तींशी संपर्क साधला. आम्हाला मिळालेल्या रचना खूपच पुरातन असाव्यात, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यावर अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. हाती लागलेला खजिना कोकणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हे लक्षात आले. ही गोष्ट सर्वांसमोर जाण्यासाठी प्रसारमाध्यमांकडे धाव घेतली. त्याच वेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे रत्नागिरी दौऱ्यावर होते. त्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केला; पण ती भेट म्हणजे आम्ही निवेदन देणे आणि त्यांनी ते गोड हसत स्वीकारणे, या पलीकडे काही नव्हते. आज हा विषय जगाच्या पाठीवर पोहोचला आहे. असे असतानादेखील त्या खात्याचा प्रतिसाद आजपर्यंत तसाच आहे.
दरम्यानच्या काळात या शोधाच्या आमच्या आतापर्यंतच्या वाटचालीची उजळणी केली. आज सर्वज्ञात असलेला कातळ-खोद-चित्र हा शब्द त्या वेळी सर्वसामान्य माणसांना माहीतदेखील नव्हता. त्या संदर्भात एखाद्याला काही माहिती असल्यास त्याची ओळख निराळी होती. तज्ज्ञ मंडळींकडून मिळालेली माहितीही अत्यंत त्रोटक होती. आम्हाला आलेल्या अनुभवांतून आमची चौकशीची दिशा बदलली. कार्यप्रणालीमध्ये बदल केले. आमच्या बदलेल्या कार्यपद्धतीला यश आले. अल्पावधीतच आठ ते १० ठिकाणी असे काही तरी आहे, अशी माहिती समोर आली. आमची शोधमोहीम तीन टप्प्यांत विभागलेली होती. पहिला टप्प्यात मिळालेल्या संदर्भानुसार खात्री करण्याचा समावेश होता. त्यानुसार खात्री करण्यात आली आणि पाच-सहा ठिकाणी चित्ररचना असल्यावर शिक्कामोर्तब झाले.
दुसऱ्या टप्प्याच्या मोहिमेची कल्पना तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना दिली. शिंदे सर म्हणजे एक निसर्गप्रेमी आणि वर्दीमागील संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समान आवडीच्या विषयातून ऋणानुबंध जुळून आले. आमच्या गप्पांमध्ये ते एक गोष्ट सातत्याने सांगायचे, की एखादे चांगले काम निःस्वार्थी भावनेने आणि सर्वस्व अर्पून हाती घेतले, की निसर्गही त्याला साथ देतो; आपल्या नकळत ते काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी तशी परिस्थिती निर्माण करतो. गरज असते ती ओळखण्याची. आमच्या कातळ-खोद-चित्रांच्या शोधमोहिमेत त्यांच्या या सांगण्याची प्रचीती आम्हाला सातत्याने येत गेली. त्यांनी लगेचच त्यांच्या परीने मदत देऊ केली. त्यांनी देऊ केलेली ही मदत मोलाची होती. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या मदतीचा आम्हाला फायदा झाला. लोकांशी संवाद साधणे सोयीचे गेले.
शोधाच्या या टप्प्यावर एकंदर पाच गावांचा समावेश होता. ही सर्व गावे राजापूर तालुक्यातील होती. (१) सफाईसाठी आवश्यक साहित्य व सोबत्यांसह भालावली गावाच्या सड्यावर पोहोचलो. परिसराची पाहणी करताना पुरातन गोष्टींकडे पाहण्याच्या आपल्याकडील लोकांच्या मानसिकतेचे यथार्थ दर्शन झाले. बहुतांशी चित्रपरिसर बाजूच्या रस्त्यामध्ये व गटारामध्ये नष्ट झाला होता. उर्वरित भागातील चित्रे शोधून साफसफाई केली. या चित्रांमध्ये गोपद्मसदृश भौमितिक रचना, मगर, वराह, पाऊल, ठसे वगैरे रचनांचा समूह मिळाला. या ठिकाणाची कथा येथे संपत नाही. पुढे आम्ही चालविलेल्या प्रयत्नांना रत्नागिरी जिल्हा परिषदेने साथ दिली. या ठिकाणाच्या विकासाकरिता जिल्हा परिषदेकडून निधी मंजूर झाला, असे कळले. या परिसराचा विकास तर सोडाच, परंतु याच ठिकाणी झालेल्या अन्य एका शासकीय कामात चित्रपरिसराला धक्क्का बसून दोन-तीन चित्रे कायमस्वरूपी नष्ट झाली आहेत. एकंदर घडलेल्या सर्व प्रकारातून लोकांची आस्था नक्की कशात आहे, यावर मात्र आमच्या मनात प्रश्नचिन्ह उभे राहिले.
बरोबर उलटा अनुभव सोलगावात आला. (२) तिथे पोहोचलो, तेव्हा त्या गावचे काही ग्रामस्थ आणि पोलीस पाटील वाट पाहत होते. गावातून घाटीने चित्रपरिसरात पोहचण्यास सुमारे अर्धा तास चालत जावे लागते. या ठिकाणी असलेल्या रचनांना एक आख्यायिका चिकटलेली आहे. सड्यावर वावरणारी गावातील वृद्ध मंडळी चित्रपरिसराला भोपळिणीचा वेल म्हणून ओळखतात. या वेलाचे मूद (मूळ) ज्याला सापडेले, त्याला संपत्ती मिळेल अशी धारणा. या समजापोटी या चित्रपरिसरात एका चित्रावर पहारीने खणल्याच्या खुणा आहेत. साफसफाई केल्यावर चित्ररचना स्पष्ट झाल्या. या रचनांमध्ये गवा रेडा, वाघ व एका अनाकलनीय चित्ररचनेबरोबर मोठ्या आकाराची भौमितिक रचना आढळून आली.
परतीच्या वाटेवर आपापसांत झालेल्या गप्पांमधून एक निराळीच गोष्ट समोर आली. या चित्रपरिसरापासूव थोड्या अंतरावर जांगळी लोकांचा देव आहे. या सड्यावर येण्यासाठी जेथून चालायला सुरुवात करतो, तिथे गांगो मंदिर (गांगेश्वर) आहे. देवाला कौल लावण्याची प्रथा कोकणात हजारो वर्षांपासून आहे. येथे गांगेश्वराला कौल लावला जातो. कधीकधी गांगेश्वर कौल देत नाही. जांगळी लोक ज्या वेळी त्यांच्या देवाला कौल लावतात, त्या वेळी गांगेश्वर कौल देत नाही, असा समज इथे आहे. एक वेगळीच गोष्ट.
आपल्या गावातील प्राचीन ठेवा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन सोबत असलेल्या गावकऱ्यांनी दिले. त्यांचे हे आश्वासन राजकीय नेते, सरकार यांसारखे नव्हते. ती जागा मूळ मालकाने काही कारणास्तव विकायला काढली आणि असलेल्या चित्रांचे संरक्षण करण्याच्या अटीवर नवीन माणसाने ती जागा विकत घेतली. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या चित्रांभोवती तात्पुरत्या स्वरूपात का होईना, चिऱ्यांच्या दगडांची रांग लावून ती जागा कायमस्वरूपी अधोरेखित केली आहे. योग्य माहिती मिळाल्यावर पुरातन ठेवा जपण्यासाठी तेथील लोकांची धडपड खरेच कौतुकास्पद आहे.
असाच अनुभव आम्हाला देवाचे गोठणे या गावात आला. (३) लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार राजापूर तालुक्यातील हे सर्वांत मोठे गाव. या गावात कोकणाचा निर्माता श्री भार्गवरामाचे म्हणजेच परशुरामाचे मंदिर आहे. या मंदिराला सुमारे ३५०-४०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. इ. स. १७१० ते १७२०च्या दरम्यान ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी मूळच्या गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला व श्री भार्गवरामाच्या मंदिराची स्थापना केली. येथे असलेली भार्गवरामाची मूर्ती आगळीवेगळी असून, अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाही. फरसबंदीयुक्त प्राकार असलेले मुघल-मराठा मिश्र शैलीतील हे मंदिर पाहणे, अनुभवणे हा एक स्वतंत्र विषय आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या देवाचे गोठणे गावाच्या सड्यावर व परिसरात निसर्ग नवलाई व आश्चर्येदेखील पाहायला मिळतात. मंदिराजवळच्या सड्यावर सुमारे साडेसात फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या रचनेची स्थानिक ओळख रावण अशी आहे. त्यावरून या सड्याला रावणाचा सडा असेही ओळखले जाते. सीतेच्या शोधात निघालेला रावण या ठिकाणी ठेच लागून उताणी पडला. त्याचा उमटलेला हा ठसा, अशी मजेशीर आख्यायिका या चित्ररचनेच्या बाबतीत सांगितली जाते. या चित्ररचनेच्या आजूबाजूला आणखीही काही रचना आहेत; पण त्या फार अस्पष्ट आहेत. या रचनांचा शोध घेत असताना आम्हाला एक अनोखी गोष्ट मिळाली.
गावागावातून चौकशी करणे, संदर्भ जाणून घेणे, मिळालेल्या संदर्भांनुसार ठिकाणाचा शोध घेणे, ठिकाणाची खात्री झाली की तिथे शोधमोहीम राबविणे, त्या जागेची साफसफाई वगैरे करत चित्ररचना उजेडात आणणे, जागेचा संपूर्ण तपशील नोंद करणे, दिशा, अक्षांश-रेखांश यांची नोंद करणे, जागेचा नकाशा बनविणे, चित्ररचनांचा नकाशा तयार करणे, आजूबाजूच्या विविध गोष्टींची नोंद घेणे, आख्यायिका, प्रथा वगैरे समजून घेणे… असे म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले, तर त्या जागेचा संपूर्ण दस्तऐवज तयार करण्याचा प्रयत्न आम्ही अंगीकारला होता.. अगदी सुरुवातीपासूनच.
या ठिकाणाचा असा दस्तऐवज तयार करताना त्या परिसरातील एका नैसर्गिक चमत्काराचा शोध आम्हाला लागला. तो चमत्कार होता चुंबकीय विस्थापनाचा. कातळचित्र आणि आजूबाजूच्या ठराविक परिसरात होकायंत्रातील चुंबकसुई योग्य दिशादर्शन करत नाही, असे लक्षात आले. होकायंत्रातील चुंबकसुई उत्तर दिशा न दाखवता कधी घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने, तर कधी विरुद्ध दिशेने, तर काही ठिकाणी ती स्वतःभोवती फिरतच राहते, हे लक्षात आले. एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. काही वेळ विश्वासच बसेना. या ठिकाणी कोणत्या तरी चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव अधिक असल्याने हे घडत आहे, हे लक्षात आले; पण हा विषय सोबत असलेल्या ग्रामस्थांच्या आकलनापलीकडचा होता. एक तर या चित्रपरिसराला रावणाचा सडा म्हणतात. त्यामुळे काही ना काही श्रद्धा-अंधश्रद्धा चिकटलेल्या. त्यात त्यांच्या डोळ्यासमोर होकायंत्रातील गोलगोल फिरणारा काटा. ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीतीचे भाव उमटले होते. त्यातूनच त्यांनी ‘साहेब आपल्या हातून कळत-नकळत काही चूक झाली आहे का? असेल तर आपण इथे नारळ देऊ या’ अशी विनंतीवजा सूचना केली. स्थानिक लोकांमध्ये या गोष्टी किती खोलवर रुजल्या आहेत, याचे दर्शन झाले.
चुंबकीय विस्थापन हे प्रकरण स्वस्थ बसू देत नव्हते, दगडातील चुंबकीय घटकांमुळे हे घडते आहे, हे जरी लक्षात आले असले, तरी नक्की काय हे जाणून घेण्याची धडपड चालू होती. भूगोल विषयातील नामांकित प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांची भेट घेतली. ते स्वतः या ठिकाणी आले. त्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने या चुंबकीय विस्थापन क्षेत्राचा प्राथमिक नकाशा तयार करण्यात आला. त्यातून पुढे आलेले अनुमान आणखी कोड्यात टाकणारे निघाले. जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दाखविणारी ही जगातील एकमेव जागा आहे हे आमच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोकणाच्या भौगोलिक व पर्यटनदृष्ट्या ही फार मोठी उपलब्धी आहे, यात शंका नाही. येथील चुंबकीय विस्थापन, तसेच जागामालक नीलेश आपटे व त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ, त्यांची मिळालेली साथ, तिथला परिसर हा अजून एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
येथून आमचा पुढचा प्रवास होता (४) हातिवले-अणसुरे मार्गावरील जुवाठी-उपळे गावातील. या ठिकाणी मार्गदर्शन करणारे कोणीच नव्हते. ‘सातविणीच्या बुंध्याखाली’ एवढाच काय तो संदर्भ. सातवीण म्हणजे कातळ सड्यावर उंच वाढणारे एक झाड. या ठिकाणी एक मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. निवळी मार्गावरील रचनेसारखी. त्याच्या लगतच असलेली मातृदेवता असावी, अशी रचना लक्षवेधक आहे. आम्हाला या चित्राचा संदर्भ मिळाला होता. नोंद करत असताना एका लहानशा अपघातात जवळच असलेल्या तब्बल ३५ फूट लांब व २४ फूट रुंद अशा चित्ररचनेचा शोध लागला. ही रचना एका नजरेत सामावत नाही. या चित्ररचनेचा नकाशा तयार केल्यावर ती रचना एका उडणाऱ्या पक्ष्याची आहे हे लक्षात आले. एकंदर रचनेवरून हे चित्र ससाणा या प्रजातील पक्ष्याचे असावे, असे वाटते. तोंडात बोट घालायला लावणारे हे चित्र. या चित्ररचनेसोबत प्राणी, मासे, मनुष्याकृती वगैरे आठ-१० रचना या परिसरात आहेत.
या परिसरातील एक वेगळी प्रथा अनुभवायला मिळाली. ढोल-ताशा हा कोकणातील एक पारंपरिक वाद्य प्रकार. इथे दोन मेळ्यांमध्ये (गटांत) ढोल-ताश्यांच्या बोलातून स्पर्धा भरते. जाखडी नृत्यप्रकारात असणाऱ्या सवाल-जबाबसारखे सवाल-जबाब ढोल-ताश्यांच्या बोलातून एकमेकांसमोर ठेवले जातात. कोकणाची कला-समृद्धी दाखविणारा हा वाद्यप्रकार. (५) देवीहसोळ गावाच्या सड्यावर आर्यादुर्गा देवीचे मंदिर वसले आहे. उपळे येथे असलेल्या चौकोनी आकाराच्या मोठ्या रचनेसारखी, पण अत्यंत सुस्पष्ट रचना या मंदिराच्या परिसरात आहे. या चित्ररचनेच्या आजूबाजूला अस्पष्ट अवस्थेत आणखी काही रचना आढळून येतात.
मार्गशीर्ष वद्य अष्टमीला येथे उत्सव साजरा केला जातो. जवळच्या भालावली गावाची देवी पालखीतून आर्यादुर्गा देवीला भेटायला येते. भेटीपूर्वी देवीची पालखी मांडावर थांबते. हा मांड म्हणजे कातळ चित्रातील चौकोनी आकाराची उठावाची मोठी भौमितिक रचना. मांडावर पालखी ठेवल्यावर देवळातील गुरव त्या रचनेच्या मधोमध असलेल्या खड्ड्यावरील दगड बाजूला करून साप बाहेर काढून देवीवरून ओवाळून परत त्याला खड्ड्यात ठेवतो. हा साप देवीचे वाहन आहे, असे मानले जाते. या वेळी कोकणात आढळून येणारा अत्यंत धोकादायक आणि विषारी असा हा फुरसे नावाचा साप चावल्याची घटना आजतागायत एकदाही घडलेली नाही.
कातळचित्र आणि त्याच्याशी निगडित परंपरा असणारे हे एकमेव ठिकाण. लोकांशी झालेल्या बोलण्यातून तेथे असलेली रचना नक्की काय आहे याची माहिती कोणाला नाही, असे लक्षात आले. काही तरी वेगळे आहे, त्याचा देवतेशी संबंध असावा या विचारातून या ठिकाणी पालखी ठेवण्याची प्रथा सुरू झाली. या माहितीमुळे मुख्य रचनेच्या आजूबाजूला असलेल्या चित्रांची झीज होण्याचे कारणही समजले.
दरम्यानच्या काळात या शोधाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून बातमीवजा वृत्त प्रसिद्ध झाले. ‘एबीपी माझा’ या वाहिनीवरून प्रसारण झाले. हा विषय बऱ्यापैकी सर्व लोकांपर्यंत पोहोचला. व्यक्तिगत चौकशी, वृत्तपत्रांतील बातम्या यातून नवीन संदर्भ हाती येऊ लागले. सगळेच संदर्भ बरोबर होते असे नाही; पण आपणहून पुढे येऊन माहिती द्यायच्या लोकांच्या प्रयत्नांना मान देणेही तेवढेच आवश्यक होते. शेकडो किलोमीटरची पायपीट चालू होती.
राजापूर तालुक्यातून मिळत असलेल्या संदर्भांबरोबर आता रत्नागिरी तालुक्यातून मिळालेल्या संदर्भांवर लक्ष केंद्रित केले. रत्नागिरी-पावस मार्गावर (६) गोळप सड्यावर चित्र आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. येथे एका माकडाचे चित्र सापडले. त्याच्या बाजूला एक चौकोन अशी दोन चित्रे. निवळी-गणपतीपुळे मार्गावरील (७) करबुडे फाट्यापासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी गोपद्मसदृश भौमितिक रचनांचा समूह आढळून आला. आकाराने कमी-जास्त असल्या, तरी सर्व रचना एकसारख्या आहेत. या व्यतिरिक्त अन्य रचना येथे आढळून येत नाहीत. या भागाला गोनीचा कातळ म्हणून ओळखले जाते. धान्य वाहून नेणाऱ्या गाड्या या ठिकाणी जमिनीत रुतल्या, त्यांच्या चाकांचे उमटलेले हे ठसे, अशी आख्यायिका या चित्रपरिसराबाबत स्थानिक लोकांकडून सांगितली जाते. चित्रांचे आकार, त्यांचा पसारा पाहता आख्यायिका आणि चित्ररचना यांचा एकमेकांशी काही संबंध असावा, असे जाणवत नाही. काही गोलगोल रचना पाहून नंतरच्या कालखंडात ही आख्यायिका या चित्रांना चिकटली असावी, असे वाटले. एकाच प्रकारच्या रचना असलेले आतापर्यंतच्या शोधातील हे एकमेव ठिकाण.
एका अज्ञात व्यक्तीने दिलेल्या माहितीवरून मेर्वी गावाच्या सड्यावरील चित्ररचनांचा शोध लागला. पावस-पूर्णगड मार्गावर असलेले हे गाव. मिळालेल्या संदर्भानुसार, या गावातील मधुकर गुरव ठिकाण दाखविण्यास सोबत आले. चालता चालता माहिती घेण्याचे काम सुरू होते. काही तरी चित्रविचित्र खुणा आहेत, त्यांचा काही अर्थ लागत नाही, असे त्यांचे सांगणे. त्यांनी एक आख्यायिका सांगितली. कोणे एके काळी या गावातील एका व्यक्तीला एक अनाहूत तेजःपुंज माणूस भेटला. ‘तुला संपत्ती देतो,’ असे सांगून तो त्याला चित्रपरिसरात घेऊन आला. तेथे असलेल्या एका मोठ्या गुहेत त्यांनी प्रवेश केला. ही गुहा सोने-नाणे वगैरे गोष्टींनी भरलेली होती. गावातील त्या माणसाचा स्वतःवर विश्वास बसेना. ‘माझी अट पाळलीस, तर ही सगळी संपत्ती तुझी,’ असे सांगून ती तेजःपुंज व्यक्ती अंतर्धान पावली. घडलेल्या अनपेक्षित प्रसंगामुळे अवचितपणे त्याच्याकडून अटीचा भंग झाला. त्यानंतर एक मोठा आवाज होऊन ही गुहादेखील लुप्त झाली. त्या वेळी उठलेल्या खुणा म्हणजे तेथे असलेल्या चित्रविचित्र खुणा अशी ती गमतीशीर आख्यायिका होता.
बोलता बोलता चित्रपरिसरात पोहोचलो. काही रेषा कातळावर वाहून आलेल्या मातीखाली आपले अस्तित्व दाखवत होत्या. साफसफाई केल्यावर चित्रे स्पष्ट झाली. या चित्रांमध्ये गवा रेडा, हत्ती, डुक्कर, मगर अशा विविध प्राण्यांचा समूह आहे. या सगळ्या रचना जणू काही एकमेकांत गुंतल्या होत्या. त्यामुळे व्यवस्थित पाहिल्याशिवाय या रचना नक्की काय आहेत, हे समजणे जरा अवघडच. कदाचित याच बाबीमुळे काही चित्रविचित्र रचना म्हणून आजपर्यंत त्यांच्याकडे पाहिले गेले. एकंदर रचना पाहून गुरव यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. एवढी वर्षे येथे वावरूनदेखील या रचना नक्की काय आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते, अशी कबुली त्यांनी दिली.
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी गावातील सड्यावर (१०) दोन ठिकाणे आहेत. एका ठिकाणी एक मनुष्याकृती व त्यासोबत वराह आणि हरीण वर्गातील प्राण्यांच्या रचना आहेत. या रचना पाहण्यासाठी मात्र नजर तयारीची असणे गरजेचे आहे. दुसऱ्या ठिकाणी वाघ, मासा या रचनांसोबत काही प्राण्यांच्या पावलांचे ठसे व एक अनाकलनीय रचना असा समूह मिळाला. या दुसऱ्या ठिकाणाला रेडे पावलाचा सडा म्हणून ओळखले जाते.
या गावातील रहिवासी डॉ. गजानन रानडे यांनी एक आख्यायिका सांगितली. गावखडी गावाची देवी आणि शेजारील कशेळी गावाची देवी या दोघी एकमेकांच्या सख्ख्या मैत्रिणी. या दोघींमध्ये काही कारणाने वितुष्ट आले. त्याचे पर्यवसान भांडणात झाले. गावखडी देवीचे वाहन रेडा आणि कशेळी देवीचे वाहन वाघ. या दोघांमध्ये जोराची मारामारी झाली. या भांडणात जी देवी हरेल, त्या देवीने दुसऱ्या देवीच्या अंगणात कायम पाणी भरायचे, अशी अट आपापसांत ठरली. भांडणात कशेळी देवीचा पराभव झाला. या भांडणाच्या दरम्यान रेडा व वाघाच्या पावलाचे ठसे उमटले, ते म्हणजे चित्रपरिसरात दिसणारे पावलांचे ठसे. ठरल्या अटीप्रमाणे कशेळी देवीने पाणी भरायचे होते. गावखडीच्या गुरववाडीमध्ये बारमाही जिवंत पाण्याचा एक झरा आहे. हा झरा म्हणजे कशेळी देवी पाणी भरते, असे म्हटले जाते. हीदेखील एक वेगळीच आख्यायिका.
एव्हाना आमच्याकडे पुरेशी माहिती गोळा होऊ लागली होती. शोधातून मिळालेल्या चित्ररचनांची छायाचित्रे आमच्याकडे होती. लोकांशी संवाद साधताना ही छायाचित्रे आम्ही दाखवू लागलो. असे काही बघितले आहे का, हे विचारणे सोयीचे जात होते. त्यात राजापूर तालुक्यात (११) साखरकोंबे गावाचा संदर्भ हाती लागला. गावात केलेल्या चौकशीतून काहीच हाती लागत नव्हते. एक दिवस अचानक त्या गावातील लहान शाळकरी मुलांची गाठ पडली. गावातील लोकांबरोबर चाललेला संवाद त्या मुलांच्या कानावर पडला. आम्ही दाखवलेली छायाचित्रे त्यांनी पाहिली आणि मुलांनी त्यांच्याबरोबर चलण्याचा आग्रह धरला. लहान मुलांमधील निरीक्षण करण्याच्या उपजत वृत्तीतून त्यांच्या नकळत आपल्याला काही वेगळी माहिती मिळून जाते, याचा अनुभव आम्हाला आमच्या निसर्गभ्रमंतीमध्ये वेळोवेळी आला होता. त्यामुळे त्यांचा आग्रह न मोडता आम्ही त्यांच्याबरोबर निघालो. सुमारे एक ते दीड किलोमीटर चालल्यावर त्यांच्या शाळेच्या मागच्या बाजूला थोडे दूर पोहोचलो. त्यांनी पुरवलेली माहिती अचूक होती. शाळेतील मुले धड रस्त्याने जातील तर शपथ, असे म्हणायची पद्धत आहे. वेड्यावाकड्या रस्त्याने शाळा गाठायची. या वेड्यावाकड्या मार्गावरील ही चित्रे. या ठिकाणाचा आमच्या शोधाचा दुसरा टप्पा शाळेतील शिक्षकांनी केलेल्या विनंतीनुसार शाळेची सुट्टी संपल्यानंतर घेण्यात आला.
शोधाच्या दुसऱ्या टप्प्यात त्या शाळेतील मुलांसह शिक्षकदेखील सहभागी झाले. तीन-चार ठिकाणी विभागलेला हा परिसर. या परिसरात मोठ्या चित्ररचनांचे प्रमाण खूप आहे. काही चित्ररचना शोधणे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखे होते. जेमतेम काही इंच दिसणारी रचना साफ केल्यावर तब्बल २४ फूट लांब व तेवढी रुंद अशी ही भली थोरली. एकंदर ३०-३५ चित्ररचनांचा हा तीन-चार ठिकाणी विभागलेला परिसर, जिथे मोठ्या माणसांना आपल्या गावात काय आहे हे माहिती नाही, तिथे लहान मुलांच्या उपजत निरीक्षणवृत्तीतून पुढे आलेला. असाच अनुभव आम्हाला पुढे आणखी एका ठिकाणी आला.
आडिवऱ्यानजीक (१२) रुढे गावाच्या सड्यावर काही चित्रे आहेत. दोन-तीन फूट लांबी-रुंदीचे काही तरी आहे, एवढ्या माहितीवर प्रवास सुरू झाला. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अत्यंत आगळीवेगळी आणि भलीथोरली रचना मिळाली. एखादे यंत्र असावे, अशी तब्बल २२ फूट लांब व २२ फूट रुंद अशी उठावाची भौमितिक रचना. या रचनेच्या लगत वाघ, देवमासा वगैरे रचनेसह मातृदेवता असावी अशी रचना मिळाली.
या चित्ररचना शोधत असताना एका अनाहूत व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार याच सड्यावर आणखी दोन ठिकाणे मिळाली. एके ठिकाणी विविध प्राण्यांच्या सुमारे ३० चित्रांचा समूह मिळाला. दुसऱ्या ठिकाणी तब्बल ९.६ फूट लांबीच्या मनुष्याकृतीसह प्राणी, गोपद्म यांचा समूह मिळाला. संबंधित जागामालकासह आजूबाजूच्या गावांतील जवळपास सर्वच लोकांना आपल्या येथे असे काही आहे, याची माहिती नव्हती. पुढे काही दिवस औत्सुक्यापोटी ही मंडळी सड्यावर या चित्ररचना पाहण्यासाठी जात होती, हे विशेष.
निनाद तेंडुलकर यांनी लांजा तालुक्यातील भडे गावात काही चित्रे असल्याचा संदर्भ दिला. (१३). या गावात दोन-तीन वेगवेगळ्या ठिकाणी चित्ररचना आहेत. एके ठिकाणी तब्बल १४.६ फूट लांबीची मनुष्याकृती कोरलेली आहे. या मनुष्याकृतीला खवण्या किंवा खवळोबा म्हणून ओळखले जाते. कुठली तरी दैवी शक्ती या परिसरात आहे, असे स्थानिक लोकांचे सांगणे आहे. यातूनच या परिसरातील गडग्याचे (कम्पाउंड वॉल) काम अर्थवट सोडून दिले आहे. श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा, त्यामुळे येथील काही रचना नष्ट होण्यावाचून वाचल्या हे विशेष. या ठिकाणी आमचे काम चालू असताना एका अनाहूत व्यक्तीने आणखी माहिती पुरविली आणि अधिक चौकशी करण्याच्या अगोदर निघूनही गेली. (१४) हे ठिकाण होते लावगण गावाच्या हद्दीत. तिथे सात-आठ रचना आहेत. तिथेदेखील निवळीसारखी मोठी भौमितिक रचना आहे. या रचनेतील वेगळेपणाकडे आमचे लक्ष वेधले गेले. यातून आमचा सर्व चित्ररचनांचा तौलनिक अभ्यास सुरू झाला. याच वेळी आम्ही परत एकदा खूप पूर्वीपासून पाहत आलेल्या (१५) निवळी, व रामरोड या ठिकाणी भेट दिली. निवळी येथे चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना आहे. हे चित्र अर्धेअधिक शेजारील मार्गाखाली नष्ट झाले आहे. (१६) रामरोड येथे पाच चित्ररचनांचा समूह आहे. यात मनुष्याकृतीसह दोन प्राणी आणि एका पक्ष्याची रचना आहे. रामरोड येथील चित्रपरिसर जागामालकाने आपल्या परीने जपला आहे. एका आख्यायिकेतून या परिसराला चोर कट्टा असे म्हणतात. एकदा गावात मोठी चोरी झाली. चोराने चोरीचा माल घेऊन पोबारा केला. गावाच्या महापुरुषाने चोराला अडवले व त्यांच्यात मारामारी झाली. महापुरुषाने त्या चोराला उचलून आपटले. तो चोर जमिनीत गाडला गेला. त्या चोराचा उमटलेला ठसा म्हणजे येथे असलेली मनुष्याकृती. या मनुष्याकृतीची एकंदर ठेवण परग्रहवासी असावा अशी आहे.
चित्ररचनांचा शोध घेतल्यावर मिळालेल्या माहितीचे संकलन, वर्गीकरण चालू होते. त्यातून असे लक्षात आले, की मिळालेल्या रचनांमधील प्राण्यांच्या रचना या वास्तवातील त्या प्राण्यांच्या आकाराशी मिळत्याजुळत्या आहेत. पक्षी या प्रकारातील काही रचना आकाराने खूपच भव्यदिव्य अशा आहेत. मनुष्याकृतींमध्ये वैविध्य आहे. भौमितिक रचनेतील आकारांमध्ये आणि विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात वेगळेपण आहे. प्राणी, पक्षी, भौमितिक रचना, मनुष्याकृती या सर्व रचना खोदून निर्माण केलेल्या, रेषेने केलेल्या आहेत. भौमितिक रचनांचे आकलन होत नसले, तरी बाकी रचनांमधून ते चित्र नक्की कोणत्या प्राण्याचे, पक्ष्यांचे आहे, याचे आकलन नेटक्या पद्धतीने होते. मोठ्या चौकोनी आकाराच्या उठावाच्या भौमितिक रचना आणि त्यांच्या आजूबाजूला सापडणाऱ्या ढोपरापासून खाली पायाच्या रचना आपले वेगळेपण दाखवून देणाऱ्या अशा आहेत.
पूर्वीपासून ज्ञात रचना आणि हाती आलेल्या रचना यात असलेला फरक आणि वैविध्य तज्ज्ञ मंडळींच्या निदर्शनास आणले. त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. चित्रांचा आकार, त्यातील वैविध्य, त्यांचा पसारा या गोष्टी त्यांच्यासाठीदेखील नवलाच्या होत्या. अर्थात त्यांच्याकडून अधिक माहिती मिळणे कठीण झाले हे मात्र नक्की.
जे आहे ते आगळेवेगळे आहे, पुरातन आहे हे मात्र निश्चित होते. म्हणून पुरातत्त्व ख्यात्याकडे धाव घेतली. त्या ठिकाणी भा. वि. कुलकर्णी हे अधिकारी होते. परंतु ‘हा माझा विषय नाही. त्यामुळे मी याबाबत काही माहिती देऊ शकत नाही,’ असे ते म्हणाले. आमची निराशा झाली; पण त्या प्रसंगातून या विषयाचा अधिक खोलवर अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. तेथून सुरू झाला चित्ररचना शोधाबरोबर त्यांच्या निर्मात्याचा शोध.
शोध घेत असताना चित्ररचनांना असलेल्या धोक्यांबाबतदेखील अंदाज आला. पर्यटनाच्या अंगानेदेखील याचे महत्त्व, वेगळेपण आमच्या लक्षात आले. अभ्यास हा न संपणारा विषय आहे; पण त्यासाठी या गोष्टी टिकणे गरजेचे आहे. या विचारातून जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सविस्तर माहितीवजा निवेदन त्यांना सादर केले. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे सर यांची मोलाची मदत मिळाली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीदेखील सकारात्मक साथ दिली.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनादेखील हा विषय सांगितला. त्यांनी त्याला प्रतिसाद देऊन राजापूरच्या प्रांताधिकारी कार्यालयात तेथील अधिकारी व नागरिक यांच्याबरोबर एकत्रित बैठकीचे आयोजन केले. या बैठकीचे फलित म्हणजे राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पुढे त्यांचे मिळालेले सहकार्य अप्रतिम असेच. आमच्या शोधकार्यासाठी आता आम्हाला रत्नागिरीच्या तीन सक्षम अधिकाऱ्यांची साथ लाभली होती.
एका बाजूला याविषयी अभ्यास करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून शोध सुरू झाला, तर दुसऱ्या बाजूला या विषयातील माहीतगार व्यक्तींचा शोध. त्याचबरोबर शोधादरम्यान मिळालेल्या ठिकाणांचा नकाशा तयार केला. त्या नकाशावरून एक आकृतिबंध तयार केला. इंटरनेटच्या माध्यमातून हाती माहिती मिळत होती; पण कोकणाशी संबंधित अगदीच त्रोटक माहिती उपलब्ध झाली. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडोपी येथे असलेल्या चित्ररचना कळल्या. त्या चित्ररचनांवर सतीश लळीत यांनी काम केले असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे असलेल्या रचनेपलीकडे आणखी काही माहिती मिळाली नाही. कुडोपी येथील रचना नवाश्मयुगीन कालखंडातील असाव्यात, असे मत त्यांनी त्यांच्या शोधनिबंधात नमूद केले आहे. गोवा राज्यात कुशावती नदीच्या किनाऱ्यावरदेखील अशा रचना असल्याचे इंटरनेटच्या माध्यमातून लक्षात आले.
एकीकडे अभ्यास चालू असताना नवीन ठिकाणांचे शोधकार्यदेखील चालू होते. ‘टिक्याच्या (ता. रत्नागिरी) कातळावर काही तरी आहे,’ एवढ्या संदर्भावर शोध सुरू झाला. गावात चौकशी करण्यासाठी गेलो असता एके ठिकाणी काही व्यक्ती भेटल्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना आणखी एका ठिकाणाची माहिती समोर आली. (१७) हे ठिकाण होते उमरे गावाच्या सड्यावर. त्यांच्यातील माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या वडिलांनी असे काही असल्याचे सांगितल्याचे आठवत होते. ‘हुमा बिलाच्या जवळ लावा तेम्बाच्या पलीकडे सातविनीच्या पल्याड’ असा हा संदर्भ. या संदर्भाच्या आधारे थोड्या शोधकार्यानंतर चित्ररचना मिळाल्या, ठिकाण निश्चित झाले. पहिला टप्पा पार पडला. परतीच्या वाटेवर सोबतची व्यक्ती सहेतुक आपल्यासोबत वावरत असल्याचा अंदाज आला. त्याचा खिसा गरम करून आणि ‘काही मिळाले तर कळवा’ असे सांगून निरोप घेतला. आमच्या एवढ्या प्रवासात अनुभवलेला हा असा पहिलाच प्रसंग.
या परिसरात तब्बल २४ चित्ररचनांचा समूह आढळून आला. यातील विशेष चित्र म्हणजे शार्क माश्याचे चित्र. गंमत म्हणजे ज्या ठिकाणाचा संदर्भ घेऊन पोहोचलो होतो, ते ठिकाण आजतागायत मिळालेले नाही.
निवळी गावडेवाडी येथे काही तरी आहे, अशी माहिती पुढे आली. (१८) गावडेवाडी परिसरात पोहोचलो, तेव्हा हा सर्व परिसर चिऱ्याच्या खाणींनी व्यापला आहे, हे निदर्शनास आले. थोडी माहिती घेण्याच्या प्रयत्नात एका वृद्ध माणसाची गाठ पडली. त्या व्यक्तीने शिल्लक चित्ररचना दाखवल्या. या रचनांमध्ये मोठी चौकोनी आकाराची उठावाची भौमितिक रचना, मातृदेवतासदृश रचना आणि विशेष म्हणजे तब्बल १५ फूट लांबीचा सर्प यासह एक वर्तुळाकार रचना आहे.
सुदैवाने शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीचा मालक तेथे आला. या चित्ररचनांना धक्का लावू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली. त्यांनीही प्राथमिक होकार दर्शवला. परतीच्या वाटेवर त्या वृद्ध माणसाने खंत व्यक्त केली. ‘आम्ही अभ्यासक आहोत,’ असे सांगून काही मंडळी या ठिकाणी पूर्वी येऊन गेली असल्याची माहिती दिली. परंतु पुढे काय? हे जपले पाहिजे वगैरे गोष्टी सांगतात; पण त्यावर कोणीच काही करत नाही. ही चित्रे पण लवकरच नष्ट होतील. बाकीच्या चित्रांसारखी. असे सांगून ‘तुम्ही स्थानिक काही करणार का,’ असा प्रश्न आमच्यासमोर मांडून ठेवला.
‘पुढे काय?’ या प्रश्नाचे उत्तर खरोखरच या ठिकाणाने सोडवले. काही महिन्यांनंतर या ठिकाणी काही पर्यटकांसोबत आलो असता चिरा खाणमालकाने आपला शब्द पाळला नसल्याचे लक्षात आले. चित्ररचनांपासून अगदी जवळ चिरा खाणीचे काम सुरू करण्यात आले होते. लगेच हा विषय जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्याकडे पोहोचवला. त्यांनी तातडीने कारवाई करून खाणीचे काम बंद केले. तसेच अन्य कोठे असा प्रकार आढळून आला, तर संबंधित काम बंद करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संबंधित कातळचित्रे ‘सात-बारा’वर नोंद करता येतील का, या दृष्टीने विचार करून, त्या ठिकाणची महसुली कागदपत्रे गोळा करण्याबाबतदेखील सूचना दिल्या. त्यामुळे कातळचित्र संरक्षणासाठी एक आश्वासक सुरुवात झाली.
येथे मिळालेल्या माहितीनुसार काही अभ्यासक भेट देऊन गेल्याचे पुढे आले. योगायोग कसा असतो… त्याचदरम्यान ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे प्राध्यापक मराठे यांची गाठ पडली. कला या दृष्टीने विचार केल्यास आढळलेली चित्रे, ती कोरण्याची पद्धती प्राथमिक अवस्थेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. श्रीकांत प्रधान यांचा संदर्भ दिला. त्यांना संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. डॉ. अशोक मराठे, प्रधान सर व सुबोध शिवलकर ही टीम कोकणातील प्राचीन बंदरे या विषयावर काम करत असताना त्यांना एक-दोन ठिकाणी चित्ररचना आढळलेल्या होत्या. त्यांच्या बोलण्यातून व त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखातून पालशेत, निवळी व देवीहसोळ या ठिकाणांचा उल्लेख समोर आला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी शुभांगी कोत्रे हिने कापडगावात चित्रे असल्याची माहिती दिली. आमच्या शोधात प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळी रचना समोर येत होती. (१९) कापडगावातदेखील वेगळी रचना समोर आली. थोड्या वेगळ्या शैलीतील सुमारे १४ चित्ररचनांचा समूह या ठिकाणी आहे. येथे असलेले समुद्री कासवाचे चित्र आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेले. या चित्ररचनांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला भुताचा सडा म्हणतात. लांबलचक पसरलेल्या सड्यावर मध्येच एक भाग काहीसा वेगळा आहे. गवताची एक काडीदेखील इथे उगवत नाही. ‘या भागावर भुताने घाण करून कुल्ले घासले. म्हणून या भागात काही उगवत नाही,’ अशी गावातील लोकांची धारणा आहे. विस्तीर्ण कातळसड्यावर काही भागात गवताची एक काडीदेखील उगवू नये, ही खरेच नवलाची गोष्ट आहे.
राजापूर तालुक्यात (२०) सोगमवाडी येथील चित्ररचना शोधत असताना त्या गावातील एका माणसाची मदत घेतली. त्याने त्यांचे देव जिथे पूजतात, त्या ठिकाणाचे दर्शनदेखील घडवून आणले. लेणे असावे असे हे डोंगराच्या एका कपारीत असलेले स्थान. याच्या बाजूला पाण्याचा एक ओढा आहे. या पाण्याच्या साठ्याला हे लोक देव मानतात आणि पूजा करतात. (२१) आडिवरे गावाजवळ कोंडसर खुर्द येथील रचनांमध्ये माकडाच्या रचनांचा समावेश आहे. याच पठारावर दुसऱ्या टोकाकडे असलेल्या (२२) राजवाडी वाडीखुर्दच्या सड्यावरील चित्रपरिसर शोधण्यासाठी गावाच्या माजी सरपंचांची मदत झाली. प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या चित्रांमध्ये एखादे चित्र नेहमी नवीन कोडे निर्माण करत होते. इथेही तोच प्रकार. प्राण्याच्या पोटात मनुष्याकृती कोरल्याचे इथे आढळून आले. या परिसरात सात-आठ चित्ररचना आढळून आल्या. तेथील कथा अजून वेगळी. शेजारी चालू असलेल्या चिरा खाणीच्या परिसरात आणखी काही रचना आहेत हे नंतरच्या कालावधीत पुढे आले. राजापूरचे प्रांताधिकारी खांडेकर यांनी तातडीने लक्ष घालून ही चिरा खाण बंद केली. खांडेकर हे एक वेगळे व्यक्तिमत्त्व. राजापुरातील पर्यटनवाढीसाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून नवदुर्गा दर्शन या वेगळ्या पर्यटनपूरक ट्रिपचे आयोजन करण्यात आले होते. अशा प्रकारचा कोकणातील हा पहिलाच पर्यटनप्रयोग होता. खांडेकरांनी कातळचित्रांबाबत त्यांच्या क्षेत्रात आढळून आलेल्या चित्रठिकाणांची कागदपत्रे गोळा करून कातळचित्रांची नोंद सात-बारा दप्तरी व्हावी, यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी पाठवून दिला. त्यांचे संपूर्ण सहकार्य आम्हाला वेळोवेळी लाभले.
पावसामुळे प्रत्यक्ष शोधाच्या प्रवासाला थोडी खीळ बसली. या कालावधीत चित्रांचे वर्गीकरण, मिळालेल्या ठिकाणांचा अक्षांश- रेखांशांच्या साह्याने एकत्रित नकाशा तयार केला. तज्ज्ञ लोकांकडून मिळालेली माहिती, या अगोदर काही ठिकाणांबाबत प्रसिद्ध झालेली माहिती याबाबत साकल्याने विचार झाला. ठाकूरदेसाई सरांमुळे एकंदर भौगोलिक रचनेचा अभ्यास करता आला. चित्रांच्या वर्गीकरणाच्या वेळी प्राणिशास्त्रातील मित्रांची मदत घेतली. त्यातून रचनेतील प्राणी नक्की कोणते हे जाणून घेणे शक्य झाले. त्यातून चित्ररचनेमध्ये मिळालेले सर्व प्राणी हे जंगलातील (वाइल्ड) आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. निवळी येथील मोठ्या चौकोनी आकाराच्या भौमितिक रचनांसारख्या रचना अन्यत्रही आढळून आल्या. त्या रचना प्रथमदर्शनी सारख्या दिसत असल्या, तरी त्यात खूप फरक आहे. आजपर्यंत मिळालेल्या संदर्भानुसार, यापूर्वी फक्त निवळी, देवीहसोळ, उमरे व बारसू याच ठिकाणी तज्ज्ञ लोकांनी भेटी दिल्या असल्याचे आढळून आले. त्यातून त्यांनी काढलेल्या अंदाजांचा पुरेसा मेळ आमच्या शोधात आढळलेल्या रचनांशी होत नसल्याचेदेखील लक्षात आले. उदा. बारसूच्या सड्यावर ज्या चित्ररचनेला तज्ज्ञ लोकांनी भेट दिली आहे, त्यांनी तिथे असलेल्या एका रचनेला दिशादर्शक चिन्ह असे संबोधले आहे. प्रत्यक्षात ते दिशादर्शक चिन्ह नसून, ती वाघळी माशाची चित्ररचना आहे.
एकंदर चित्ररचनांच्या ठिकाणचा पसारा लक्षात आला. त्यावरून आणखी कोठे चित्ररचना असू शकतील, याचा अंदाज बांधून चौकशी सुरू केली. मिळालेली माहिती कार्यक्रम, छायाचित्र प्रदर्शन या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन जाऊ लागलो. वेगवेगळ्या माध्यमांतून अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालूच होता. आलेल्या अनुभवांतून शोधपद्धतीतदेखील थोडा बदल केला. सरकारदरबारी थोडा अधिक प्रयत्न चालू केला. पुढे येत असलेल्या माहितीतून भारतात अन्यत्र असलेल्या अशा प्रकारच्या चित्ररचनांपेक्षा वेगळ्या रचना, त्यांची निर्मितीची पद्धत यातील फरक स्पष्ट होऊ लागले. वृत्तपत्रे, शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संस्था यामध्ये केलेल्या कार्यक्रमांतून कातळ-खोद-चित्रे हा शब्द सर्वांपर्यंत पोहोचला. नाही म्हटले तरी काही प्रमाणात जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश आले.
पाऊस कमी होताच शोधमोहिमेच्या पद्धतीत केलेल्या बदलानुसार चौकशी सुरू झाली. (२३) गणपतीपुळे रस्त्यावरील चवे-देऊड या गावाच्या सड्यावर चित्रे असावीत, असा आमचा अंदाज त्याच गावच्या विलास काळेंकडे बोलून दाखवला. त्याला त्यांनी प्रतिसाद देऊन माहिती घेतली आणि खरोखरच त्या गावाच्या सड्यावर चित्रे असल्याचे निश्चित झाले. या ठिकाणी १४-१५ चित्ररचनांचा समूह आहे. यातील १८ फूट लांबीची एकशिंगी गेंड्याची चित्ररचना आमच्या विचारांना वेगळी दिशा देऊन गेली. एकशिंगी गेंड्याचे वास्तव्य सध्या अखंड जगात फक्त आसाममध्ये आहे. मग त्याची चित्ररचना इथे कशी काय? अद्याप कोकणात त्याच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत.
(२४) परचुरी गावाच्या सड्यावर १५-१६ चित्ररचनांच्या ठिकाणी एक आख्यायिका ऐकायला मिळते. मुलीच्या लग्नाचे संपूर्ण वऱ्हाड कोवळ्या कातळात बुडाले. त्यांच्या उमटलेल्या खुणा म्हणजे इथली कातळचित्रे. चित्ररचनांमध्ये दिसणाऱ्या आकारांना ‘ही दागिन्याची पेटी, हातातला नारळ,’ वगैरे पद्धतीने वृद्ध मंडळींकडून ओळखले किंवा सांगितले जाते.
इथल्या आख्यायिकेने आम्हाला नक्कीच विचारात टाकले. कातळात एखादी गोष्ट कशी काय गाडली जाऊ शकेल. कोवळा कातळ म्हणजे काय? मग प्रवास सुरू झाला आख्यायिका उलगडण्याचा. कोकणात कातळ सर्वत्र असला, तरी त्याच्या काठिण्यात फरक आहे. कोठे तो फार कडक आहे, तर कोठे नरम. याला या कातळाच्या निर्मितीमागील प्रक्रिया कारणीभूत आहे. जेथे कोवळ्या कातळात वऱ्हाड बुडाले, ही आख्यायिका ऐकायला मिळते, तिथे असलेला कातळ नरम आहे. मग अशा बुडणे, गाडणे अशी आख्यायिका असलेल्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती परत एकदा नजरेखालून घातली. आणि अशा प्रकारच्या आख्यायिकांमागील गर्भितार्थ उलगडला. या चित्ररचना आणि आख्यायिका यांचा कोणताच संदर्भ एकमेकांशी नाही. कातळसड्यावर काहीशा गूढ वाटणाऱ्या या रचना पाहून त्याभोवती वेगवेगळ्या आख्यायिका गुंफल्या गेल्या; पण या आख्यायिकांतून तेथील भौगोलिक परिस्थिती काय असावी, याची माहिती मिळते.
परचुरीच्या या सड्यावर असताना आमची एका हरहुन्नरी व्यक्तीशी गाठ पडली. ती व्यक्ती अनोळखी तर नव्हतीच. आमचा चांगला मित्र मिलिंद खानविलकर. उक्षी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा भार सध्या या व्यक्तीच्या खांद्यावर आहे. आम्ही त्याला सूचना केली, ‘तुमच्या गावाच्या सड्यावरदेखील अशा रचना आहेत. एकत्र शोध घेऊ.’ उक्षी गावाचा सडा परचुरी, करबुडे, जांभरुण यांच्या मधला. या सर्व ठिकाणी चित्ररचना आहेत. (२५) जांभरुण गावाच्या सड्यावर तब्बल ४२ चित्ररचनांचा समूह आहे. वेगवेगळ्या आकाराच्या आणि शैलीच्या मनुष्याकृती हे या ठिकाणचे वैशिष्ट्य. या परिसराला राक्षसाची जाल असे म्हणतात.
करबुडे, जांभरुण, परचुरी येथील माहिती मिलिंदला दिली. रचना कशा शोधायच्या, याची कल्पना त्याला दिली. खरेच अत्यंत उत्साही अशा मिलिंदचा दोन दिवसांतच निरोप आला. (२६) उक्षी गावाच्या सड्यावर चार-पाच ठिकाणी मिळून सुमारे चाळीसेक चित्ररचना या ठिकाणी आहेत. एके ठिकाणी फक्त लहान-मोठ्या भौमितिक रचना आहेत. दुसऱ्या ठिकाणी असलेली चित्ररचना लक्षवेधक आहे. तब्बल १८ फूट लांब व तेवढी रुंद अशी हत्तीची रचना.
मधल्या कालखंडात आमचे सरकारदप्तरी प्रयत्न चालूच होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आमच्या कामाचे महत्त्व ओळखून, ग्रामीण पर्यटन विकास योजनेमध्ये कातळचित्रांच्या ठिकाणांचा समावेश केला आणि आपल्या परीने संपूर्ण मदत देऊ करण्याचा प्रयत्न केला. तसे पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळत असलेले सहकार्य वादातीत होते. अशी दुर्मीळ उदाहरणे असतात. त्यात आम्ही एक होतो.
देशभ्रतार यांनी घेतलेला पुढाकार सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्याला उक्षीचे सरपंच मिलिंद यांनी खऱ्या अर्थाने चांगला प्रतिसाद दिला आणि कातळचित्राच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग करून घेतला.
दरम्यानच्या काळात आमच्या पाठी उभ्या असलेल्या या तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली झाली. अर्थात सरकारदरबारी नवा गडी नवे राज्य सुरू झाले. ते प्रयत्न एका बाजूला चालू असताना दुसरीकडे शोधकार्य चालूच होते.
प्र. के. घाणेकर यांच्यामुळे ‘महाराष्ट्र अनलिमिटेड’ या अंकातून लेख प्रसिद्ध झाला. आशुतोष बापट यांची सरांमुळे ओळख झाली. त्यांची मदत सातत्याने होत होती आणि आहेही.
एका बाजूला अप्रतिम सहकार्य मिळत होते, तर काही प्रसंगी वाईट अनुभवदेखील पदरात पडत होते. इतिहास या विषयात अनेक वर्षे काम करणाऱ्या एका संस्थेने आमच्याकडून माहिती घेऊन वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न चालविला. या गोष्टीचे नक्कीच वाईट वाटले. ज्ञानदानाच्या क्षेत्रातील या गोष्टीची खंत वाटली.
शोधात नवनवीन ठिकाणांची भर पडत होती. (२७) कोतापूर, (२८) शेडे, (२९) नाटे, (३०) विखारे गोठणे, (३१) जयगड, (३२) कुरतडे, (३३) मासेबाव, (३४) रावारी, (३५) हर्चे, (३६) भडे, (३७) बेनी, (३८) कोळंबे अशी विविध ठिकाणे. प्रत्येक ठिकाणची चित्रे वेगवेगळी. काही ना काही कोडे निर्माण करणारी आणि आख्यायिकांपासून दूर. या सर्व प्रवासात आलेल्या अनुभवातून मिळालेल्या सर्व ठिकाणांचा परत एकदा साकल्याने विचार केला. त्यातून चवे देऊड पंचक्रोशीत (३९) चवे गावी नवीन ठिकाण समोर आले. देवीहसोळ परिसरात अनेक चित्ररचना मिळाल्या. बारसूच्या सड्यावर आणखी खूप मोठा खजिना हाती लागला. यापूर्वी अभ्यासकांनी मांडलेली मते, गृहीतके यांचा नव्याने अभ्यास करणे गरजेचे आहे, हे आमच्या शोधकार्यात आलेल्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे. बारसूच्या सड्यावर मिळालेल्या खजिन्याने ही गोष्ट अधोरेखित केली आहे.
कातळचित्रांच्या शोधाबरोबर आम्ही आडवळणावरचे कोकण जवळून अनुभवत होतो. जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांची ओळख होत होती. पक्षी कुळातील वेगवेगळ्या प्रजातींची भर पडत होती. कास पठाराएवढे सौंदर्य कोकणातील या कातळसड्यांवर अनुभवायला मिळत होते. कोकणातील जैवसाखळीतील सर्वोच्च स्थानी असलेल्या बिबट्याचे दर्शन हे आमच्या दृष्टीने नेहमीचेच झाले.
गोवळ गावच्या टिपऱ्या, जैतापूर येथील खारवी समाजातील समई नृत्य, राजापुरातील शिमगोत्सवातील रोम्बाट ही आगळीवेगळी प्रथा, धनगर समाजातील गजा नावाचा नृत्यप्रकार, भडे गावातील निखाऱ्यावरून चालण्याची प्रथा, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून कोकणची समृद्धी अलगद उलगडली जात होती.
उक्षीतील ग्रामस्थ आणि सरपंचांच्या पुढाकाराने झालेले कातळ-खोद-चित्राचे संरक्षण
शिंदे सरांचे शब्द अगदी खरे होते. कोकण विभागीय आयुक्त म्हणून डॉ. जगदीश पाटील यांची बदली झाली. त्यांना या विषयात विशेष रुची आहे. त्यांच्या येण्याने सरकारी पातळीवर काहीशा रेंगाळलेल्या विषयाला गती मिळाली. त्याचदरम्यान रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांची गाठ पडली. त्यांच्याकडून लाभत असलेल्या मदतीबाबत सांगण्यास शब्द अपुरे पडतील. खरे सांगायचे झाले, तर ते आमच्या टीमचे एक सहकारी बनून गेले आहेत. योगायोग म्हणजे महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाचे संचालक म्हणून तेजस गर्गे यांच्याकडे कारभार सोपविला गेला. गर्गे सर स्वतः पुरातत्त्व शास्त्रज्ञ. महाराष्ट्र राज्य शासनाच्या या विभागाला याच विषयातील व्यक्ती संचालक म्हणून तब्बल २२ वर्षांनी लाभली. आमच्या शोधाच्या दृष्टीने ही खूप महत्त्वपूर्ण अशी बाब. त्यांची गाठभेट झाली आणि कातळचित्र या विषयाला ‘बुलेट ट्रेन’ची गती मिळाली. कातळचित्रांच्या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळविण्यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि आजही ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
मधल्या कालखंडात या विषयाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. सरकारदरबारी ही चित्रठिकाणे संरक्षित करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत सातत्याने विचारविनिमय चालू आहे. त्यात अमित शेडगे यांच्याबरोबर लोकसहभागातून ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सूचित केले. त्याला त्यांनी प्रतिसाद दिला. याही वेळी मिलिंद खानविलकर उभे राहिले आणि बघता बघता लोकसहभागातून उक्षी येथील गजराज संरक्षित झाले. जागामालक, स्थानिक ग्रामस्थ यांना सरकारी अधिकाऱ्यांची साथ लाभली, तर काय होऊ शकते, याचे एक जिवंत उदाहरण उभे राहिले. चित्र संरक्षित झाल्यापासून अवघ्या काही महिन्यांत सुमारे सात हजारांहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. स्वाभाविकच त्याचा परिणाम स्थानिक व्यापारी वर्ग व जनतेला झाला आहे. अखंड महाराष्ट्रात प्रागैतिहासिक ठिकाण लोकसहभागातून संरक्षित झाल्याचे हे पहिलेच उदाहरण. हा मान उक्षी या लहानशा ग्रामपंचायतीने पटकावला. मिलिंद खानविलकर यांच्यासारखे सरपंच सर्वत्र लाभले तर कोकणाचा शाश्वत विकास होण्यास वेळ लागणार नाही.
कातळ चित्रांबरोबर आमचा मंदिरांवरही अभ्यास होत होता. मंदिरातील वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. आज जगाच्या पाठीवर पोहोचलेले दशावतारी खेळे सर्वांना ज्ञात आहेत; पण कधीतरी लुप्त पावलेल्या या कलेला आडिवऱ्याच्या महाकाली मंदिरात पुनरुज्जीवन मिळाले आहे, हे कीती लोकांना ठाऊक आहे? गणेशगुळ्यातील लक्ष्मी- दामोदरची दुर्मिळ मूर्ती, गोवळमधील ब्रह्मदेवाची अत्यंत सुरेख मूर्ती, साटवलीमधील गुप्तकालीन विष्णूमूर्ती, अशी एक ना दोन… कोकणाचे वैभव असणारी ही मंदिरे.
मध्यंतरीच्या कालखंडात आणखी एक ठिकाण मिळाले. (४१) कशेळी. राजापूर तालुक्याच्या उत्तर टोकावर वसलेले हे गाव. या गावाच्या सड्यावर एका भल्या थोरल्या चित्ररचनेशी आमची गाठ पडली. ‘अबब’ हाच शब्द त्या रचनेला योग्य. सुमारे ५० फूट लांब व ४० फूट रुंदीची ही हत्तीची चित्ररचना. ही चित्रे नीटनेटकी पाहायची झाल्यास आपल्याला हवेत किमान ५० फूट जावे लागते. या रचनेमध्ये विविध प्राणी, पक्षी, जलचरही कोरलेले आहेत. तब्बल ८० चित्रांचा एकत्रित समूह. भारतातील या प्रकारातील एखाद्या प्राण्याचे हे सर्वांत मोठे चित्र. या परिसरात एकंदर १२५ चित्ररचना आहेत. आजपर्यंत आमच्या शोधात मिळालेला हा सर्वांत मोठा समूह. या चित्ररचनेने परत एकदा वेगळ्या विचारांना गती दिली.
चित्ररचनांना राज्य संरक्षित स्मारकांचा दर्जा देण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडून ऋत्विज आपटे यांची नेमणूक करण्यात आली. आपटे स्वतः पुरातत्त्व अभ्यासक. त्यांच्यासोबत महसूल खात्याच्या अधिकारीवर्गाबरोबर सर्व ठिकाणांचा एकत्रित सर्व्हे सुरू झाला. या सर्व्हेदरम्यान आपटे यांच्या ज्ञानाचा आम्हाला अधिक उपयोग झाला. तत्कालीन मानवाने वापरलेली दगडी हत्यारे आम्हाला मिळाली. कातळ-खोद-चित्रांच्या कालनिश्चितीसाठी थोडीफार का होईना, एक दिशा मिळाली.
या सर्व्हेदरम्यान माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा पाहायला मिळाल्या. सर्व्हेवेळी उमरे गावात गेलो. त्या वेळी गावातील ४०-५० माणसे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचा विरोध होता. ‘आमची जागा आहे. आम्ही देणार नाही,’ वगैरे गोष्टींनी सुरुवात झाली. ती माणसे आम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हती. ही चित्रे पुरातन नाहीत, असे त्यांचे सांगणे होते. त्यांच्याबरोबर झालेल्या संवादात त्यांच्याच बोलण्यातून ही चित्रे कोणी कधी निर्माण केली हे माहिती नसल्याचे निदर्शनास आणून दिले, तेव्हा कुठे राग थोडा शांत झाला. या चित्रांचे महत्त्व, त्यामुळे गावाला होणारा फायदा या बाबींची कल्पना दिली. कोकणी माणसाची टिपिकल ओळख ही मंडळी बाजूला ठेवतील अशी अपेक्षा. उक्षीचे उदाहरण सर्व लोकांनी समोर ठेवले, तर या चित्रांचे संरक्षण नक्कीच शक्य आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालूच आहेत.
शोधप्रवास आजही चालूच आहे. रत्नागिरी जिल्ह्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील आमचा प्रवास सुरू झाला आहे. आजमितीस ५२ गावांतून सुमारे ९० ठिकाणी १२००हून अधिक कातळ-खोद-चित्ररचना शोधण्यास यश मिळाले आहे. खरे म्हणजे प्रत्येक ठिकाणावर एक स्वतंत्र लेख होईल.
या चित्ररचना का कोरल्या गेल्या? त्यामागील उद्देश काय? चित्ररचनेतील गेंडा, पाणघोडा हे प्राणी कधी काळी कोकणात अस्तिवात होते का? त्यांचा कालखंड कोणता? या रचना एकाच कालखंडात कोरलेल्या आहेत की वेगवेगळ्या? देव, धर्म, भाषा या गोष्टी त्या माणसाला माहिती होत्या का? मानवी उत्क्रांतीचे गूढ आणि अगम्य प्रश्न घेऊन ही कातळचित्रे आपणासमोर उभी आहेत.
कातळ-खोद-चित्रांमधील विविध रचना, त्यांचे आकार, शैली मिळालेली दगडी हत्यारे यांचा विचार करता या रचना निर्माण करणारा मानव भटका होता. अन्न मिळविण्यासाठी तो पूर्णपणे शिकारीवर अवलंबून होता. शेतीचे ज्ञान त्याला अवगत झाले नव्हते असे दिसते. यातून या रचना इसवी सन पूर्व १० हजार ते १२ हजार या कालखंडातील असाव्यात, असा अंदाज तज्ज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे. अश्मयुगीन कालखंडातील या रचना भारताच्या प्रागैतिहासिक कालखंडावर नव्याने प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. अर्थात अधिक सखोल अभ्यासाची आणि अधिक पुराव्यांची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा प्रवास चालू आहे.
एक महत्वाआहची बाब म्हणजे या शोधाची दखल बीबीसी, दी हिंदू, लाइव्ह इंडिया, हिस्टरी डॉट कॉम यांसारख्या जगातील अग्रगण्य प्रसारमाध्यमांनी घेतली आहे. त्यामुळे अन्य देशांतील तज्ज्ञ, पर्यटकही कोकणाकडे वळू लागले आहेत. कातळ-खोद-चित्रांचा शोध, संरक्षण व संवर्धन या आमच्या विषयाला आता योग्य बळ मिळू लागले आहे. आमचा हा प्रवास पूर्णपणे तन, मन, धन अर्पून चालू आहे. आजपर्यंत एक नया रुपयाचीही मदत संस्था, सरकार किंवा व्यक्ती अशा कोणाकडूनही मिळालेली नाही. हे मुद्दाम लिहायचे कारण, की महाराष्ट्र सरकारने २४ कोटी रुपयांची घोषणा केली आहे; पण ती फक्त घोषणा आहे. कोकणाच्या सांस्कृतिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या दृष्टीने हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी जपण्यासाठी सर्वांच्या साथीची गरज आहे.
कातळचित्रांच्या शोधात आम्हाला फक्त ती चित्रेच मिळाली, असे नव्हे, तर आडवळणावरील कोकणाचे खरेखुरे सुंदर रूप आमच्यासमोर उलगडले. माणसांच्या स्वभावांचे अंतरंग उलगडले, कातळचित्रे म्हणजे फक्त चित्रांचा अभ्यास नव्हे. तो अभ्यास आहे पुराशास्त्राचा, माणसाच्या उत्क्रांतीचा, भौगोलिक गोष्टींचा, जैवविविधतेतील वेगवेगळ्या घटकांचा. भौतिक आणि रसायनशास्त्राचा. म्हणूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण असा हा विषय आहे.
संपर्क : ९४२२३ ७२०२०, ९४२३२ ९७७३६
ई-मेल : bhairisbud@gmail.com
(साप्ताहिक कोकण मीडियाच्या २०१८च्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध झाला होता.)
कोकणासारखा गुढ प्रदेश महाराष्ट्रात अन्यत्र कोठे नसेल. येथे रूढी- प्रथा, परंपरा आणि भुतं-खेतं अगदी देव-देवस्की, जारण-मारण यांचे जेवढे गुढ येथे आहे तेवढे गुढ कोठे आढळणे कठीण. या सार्या गुढांमागचे रहस्यही कोणाला अजून स्पष्ठपणे उलगडता आलेले नाही. कोकणात सध्या आणखी एक गुढ सध्या चर्चेेत आहे. ते म्हणजे कोकणातल्या जांभ्या दगडांवर कोरलेल्या कातळशिल्पांचे. कोणी कोरली असतील ही कातळशिल्प? का कोरली असतील? कधी कोरली असतील? काय असेल या कातळशिल्पांचा अर्थ? या सार्या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी अनुत्तरीतच आहेत. ती उत्तरे शोधण्याचे स्तुत्य प्रयत्न अनेकांनी सुरू केले आहेत. कातळशिल्पांच्या गुढांमागचे रहस्य उलगडेल तेव्हा उलगडेल, पण त्याआधी आपल्याला त्या कातळशिल्पांचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण कोकणात जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. कोकणवासियांनी आपल्या वहिवाटीच्या कातळावर गडगे घालून, कलमे लावून आणि चिरे खणी काढून ही कातळशिल्पे अज्ञानापोटी नष्ट करायला सुरूवात केली आहे. रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कातळ भाग आहे. या कातळभागावर अनेक गुढ आकृत्या आहेत. त्याच कातळशिल्पांविषयी थोडक्यात..
६००० वर्षे जुनी?राजापूरच्या कातळावर तब्बल चौदा चौरस किलोमीटर अंतरावर अनाकलनीय शिल्पे आढळली आहेत. मासे, जलकुंभ, जलसर्प अशा जलस्थानाशी निगडीत शिल्पाकृती या कातळांवर कोरलेल्या आहेत. कोकणातल्या जांभा दगडाच्या कातळावर आढळणारी शिल्प हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व नकाशांनी ही शिल्प समृद्ध आहेत. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे अशी दुर्मिळ शिल्पे गायब झाली आहेत. ही चित्रे, नकाशे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इसवी सन पूर्व ६००० वर्षे जुनी असावीत.
विलक्षण अविष्कार
कोकणातील जांभा दगडाचा, विशेषतः कातळ रचनेचा अभ्यास करीत असताना असे आढळले की, इथल्या दुय्यम जांभा पठारावर ती प्रामुख्याने काढली गेली आहेत. देवगड आणि विजयदुर्ग येथील सडा हा जांभ्याचे आदर्श असे कातळ आहे असे मानण्यात येते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातला कातळ सडा हा निसर्गाचा एक विलक्षण आविष्कारच आहे. येथील कातळाची जाडी २५ मीटरपेक्षा जास्त असून, भूजल साठेही खूप खोल आहेत. राजापूरच्या कातळावर जुवाठी- उपळे- प्रिंदावण या त्रिकोणात उपळे गावाच्या सीमेवर आम्हाला चौदा चौरस किलोमीट कातळावर अनाकलनीय शिल्प आढळली आहेत. मासे, जलकुंभ, पाण्यातील साप अशा जलस्थानाशी निगडीत चित्रविचित्र शिल्पाकृती यावर काढल्या आहेत. मे महिन्यात कातळावरचे सगळे गवत नाहीसे झाल्यावर त्यावर जलस्थानांशी संबंधित आकार दिसतात, असे स्थानिक नागरिक सांगतात. शास्त्रीय पद्धतीने या प्रदेशातील कातळ चित्रांचा मागोवा घेणे गरजेचे आहे.
शोधनिबंधाद्वारे प्रसिध्दी
कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची सतरावी राष्ट्रीय कॉंग्रेस संपन्न झाली. राष्ट्रीय स्तरावरील या परिषदेमध्ये, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी एका शोध निबंधाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांच्या सविस्तर माहितीचे छायाचित्रांसह सादरीकरण केले. स्वतः लळीत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
परस्पर संबध असावा?
या ठिकाणी असलेले मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. हिवाळे येथील सड्यावरही अशाच कातळशिल्पांचा शोध लळीत व त्यांचे बंधु प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी २००२ मध्ये लावला होता. पश्चिम किनारपट्टीवर गोव्यातील उसगाळीमळ, महाराष्ट्र - गोवा सीमेवरील विर्डी, हिवाळे, कुडोपी, खानवली (राजापूर), निवळी (रत्नागिरी) अशा अनेक ठिकाणी ही कातळशिल्पे आढळली असून त्यामध्ये काही परस्परसंबंध (लिनिएज) असण्याची शक्यता लळीत यांनी आपल्या सादरीकरणाच्या वेळी व्यक्त केली.या परिषदेला देशभरातून जमलेल्या रॉक आर्ट क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच हौशी संशोधकांनी लळीत यांच्यासंशोधनाबद्दल आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच रॉक आर्टच्या नकाशावर येत असल्याबद्दल संतोष प्रकट तर केलाच. पण, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच जगासमोर आलेला आपल्या देशातील हा अनमोल खजिना जतन करुन त्याची नीट प्रसिद्धी केल्यास सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा रॉक आर्टच्या जागतिक नकाशावरमानाचे स्थान पटकावेल, असा विश्वासही व्यक्त केला.निवळी फाट्यावर नकाशासिंधुदुर्गप्रमाणे कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या अन्य जिल्ह्यातही विविध ठिकाणी जांभा पाषाणावरकोरलेली लक्षणीय अशी चित्रे, नकाशे, काष्ठ शिल्पे, गुहा, लेणी, मंदिरे आढळून येतात. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंब्याच्या पुढे निवळी तिठ्याजवळ जांभा दगडावर कोरलेला एक भला मोठा पथदर्शक नकाशा हा कुतुहलाचा विषय होता. सध्या मात्र हा पथदर्शक नकाशा निदर्शनास येत नाही. बहुदा तो रस्ता रुंदीकरणाच्या कारणाने गायब केला गेला असावा. नव्या पिढीला या कोरीव नकाशाची फारशी माहिती देखील नाही. सदरनकाशा हा आंबा घाट, अणुस्कुरा घाट, गगनबावडा घाट, संगमेश्वर आदी ठिकाणाहून त्या काळात व्यापार -उदीमासाठी येणार्या व्यापार्यांना निश्चितच पथ- मार्गदर्शक ठरला असेल.
नाचण्यात नौकेच चित्र
रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात एकेकाळी बंदर असलेल्या बारसू या गावातील मोठ्या डोंगरावर असलेलीकोरीव चित्रे ऐतिहासिक अभ्यासकांना व संशोधकांना आजवर एक आव्हान ठरली आहेत. ही चित्रे प्रत्यक्ष पाहताना ती कोणत्या तरी धार्मिक कारणासाठी काढलेली असावीत असेच वाटते. मात्र ती चित्रे कोणी आणि कधी कोरली यासंदर्भातील शोध अद्यापही लागलेला नाही. रत्नागिरी नजिकच्या नाचणे या गावीही अशाच प्रकारचे जांभा दगडावर कोरलेले नौकेचे चित्र पहावयाला मिळते.शिलाहार काळाचा संदर्भरायगड जिल्ह्यात कान्हेरी, कुडेमांदाड, चौल गांधारपाले (महाड) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पणदेरी, पन्हाळेकाझी, कोळकेवाडी, कळंबस्ते या ठिकाणची जीर्णावस्थेत असलेली लेणी हीसुध्दा बहुतांशी दुर्लक्षितच राहिलेली आहेत. कोकणात या व अशा अनेक लेण्यांची उभारणी इसवी सनापूर्वी २०० वर्षे आधी झाली असावी, असा अंदाज वर्तविला जातो. कोकणात बौध्द धर्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी गावोगावी फिरणारे बौध्दभिक्खू हे या लेण्यांचा वापर त्यांच्या वास्तव्यासाठी आणि साधनेसाठी करीत असावेत, असे अनुमान काढले गेलेआहे. नंतरच्या मध्ययुगीन काळात कोकणात दीर्घकाळ शिलाहार राजांनी राज्य केले. त्या कालखंडात कलेचा खर्या अर्थाने विकास व संरक्षण झाले, असे अभ्यासकांचे मत आहे.
शिलाहार राजांच्या कालावधीमध्ये विकसित झालेली कला व कलाकारांना मिळालेले आश्रयस्थान याची साक्ष म्हणजेच कसबा- संगमेश्वर येथील हेमाडपंथी श्री कर्णेश्वरमंदिर, हे होय . या संपूर्ण परिसरात लहानमोठी सुमारे ३६० मंदिरे आढळून येतात. म्हणूनच या ठिकाणालापूर्वीच्या काळी दक्षिण काशी असेही म्हटले जात असे.कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्मित झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून ती फारच अतिप्राचीनआहे. या कलात्मक संस्कृतीची निश्चित कालगणनाही अद्याप झालेली नाही.तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कधी, कोणासाठी निर्माण झाली आणि कोणी निर्माण केली, याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत किंवा त्यांचा साधा मागमूसही सापडलेला नाही.कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारखी अनेक ठिकाणे पुरातत्वीयदृष्ट्या खूप महत्वाची असून ती या भागातील आदिम मानवी समूह वत्यांची वसतीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध करून देऊ शकतील. मात्र, या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने परिक्षण होणे, हाती येणार्या माहितीचा संयुक्तिक अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे इत्यादी बाबींवरलक्ष केंद्रीत करावे लागेल. अशा प्रकारच्या संशोधनामुळे कोकण प्रांताच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. तसेच, ही ठिकाणे पर्यटनदृष्ट्याही विकसित केल्यास कोकणच्या पर्यटन विकासालाही त्यांचा निश्चितच हातभार लागू शकेल. मात्र त्यासाठी सरकारला संबंधित क्षेत्रे अधिग्रहीत करुन ती संरक्षित म्हणून जाहीरकरावी लागतील.मात्र अशी कृती आजपर्यंत कोणत्याच सरकारने केलेली नाहीत. कोकणातील लोकप्रतिनिधीही या बाबतीत उदासीन आहेत.
अमोल पालये, रत्नागिरी.
वाडाजूनच्या सड्यावर 30 कातळशिल्पांचा खजिना!
March 14, 2024
दिवाळीदिवशी वाडाजूनच्या सड्यावर
शोधला 30 कातळशिल्पांचा खजिना!
सडयेच्या तरूणांनी शोधली मानवासह रेड्यांची मोठाली पावलं, गुढ चाव्या, प्राणी आणि मडके
सहभागी तरूण आणि तरूणी.
रत्नागिरी : नरकचतुर्दशी म्हणजे पहाटेचे अभ्यंगस्नान, दिवाळी फराळ आणि फटाक्याची आतषबाजी.. हा सारा नेहमीचा रिवाज टाळत सडयेतील तरूणांनी सलग तिसर्या वर्षी नरकचतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. या शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल तीसेक ठाशीव, सुस्पष्ठ कातळशिल्पांचा समुह आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठाली अशी एकूण 10 रेड्यांची पावलं या ठिकाणी आढळून आली आहेत. 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठाल्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्रे प्रथमच आढळली आहेत.
सडयेतील तरूण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गुढकथांनी प्रसिध्द असलेल्या ठिकाणी गेली होती. बारा रेड्यांची जोतं आणि बारा माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटनेठिकाणी जावून या तरूणांनी सर्व अंधश्रध्दांना मुठमाती देण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्त केला.
या पदयात्रेद्वारे सडे-कातळ धुंडाळून त्यावरील पाण्याचे स्त्रोत, प्राचीन देवस्थाने, देवराया, पाण्याची टाकी, बारव, कातळशिल्पे, घाट्या, सड्यावरील जीवसृष्टी, रानटी झाडे आणि त्यांचे औषधी उपयोग आदी.ची माहिती सडयेतील तरूण-तरूणी, विद्यार्थी एकत्रितरित्या बुजुर्गांच्या मदतीने घेत असतात. सडयेतील शालेय विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी होत असतात. त्यामुळे भावी पिढीला निसर्गवाचन होते. परिसर-भूगोलाची माहिती मिळते. इतिहास-संस्कृती याविषयी ज्ञान मिळते. गेली दोन वर्षे काढलेल्या पदयात्रेत सडयेच्या सड्यावरील कातळशिल्पे शोधून त्यांचे संवर्धन प्रयत्न करण्यात आले आहेत. याशिवाय टाकी, बारव उजेडात आणण्याचे काम केले आहे.
यावर्षीची पदयात्राही अशीच वैशिष्ठपूर्ण ठरली आहे. सकाळी 9 वा. सडये देवस्थान येथून ही पदयात्रा सुरू झाली. यावेळी या शोधयात्रेचे संस्थापक सदस्य आणि वाटाडेे म्हणून काम पाहणारे स्व.सुरेश उर्फ आप्पा धुमक यांना श्रध्दाजंली वाहून पदयात्रेची सुरूवात करण्यात आली.
रेड्यांची ठाशीव पावले.
ओघवती माहिती
यावर्षीच्या पदयात्रेचे मार्गदर्शन सडये-पिरंदवणे-वाडाजून परिसराची इत्यंभूत माहिती असणारे रानमाणूस श्री.आत्माराम धुमक यांनी केले. रानवाटा, गावांच्या सीमारेषा, जमीन मोजणीच्या जुन्या ऐरणी, रानटी औषधी झाडे आणि त्यांचे उपयोग, प्राचीन बांधीव घाट्या, कातळशिल्पे आणि त्यामागच्या दंतकथा याबाबत सार्या प्रवासात ओघवती माहिती दिली.
कातळावर पाणीस्त्रोताजवळ फुललेली कमळे.
रानकमळांची बाग
विस्तीर्ण पसरलेल्या आणि रणरणत्या उन्हात तापलेल्या कातळावर एकेठिकाणी पांढर्याशुभ्र रानकमळांची सुरेख बागही द़ृष्टीपथास आली.
8 किमीची पदयात्रा
कातळशिल्प प्रवासाला सुरूवात करताना वाडाजून या गावची भव्य घाटी लागली. गर्द झाडीच्या छायेतून पदयात्रेने कातळावर प्रवेश केला. वाडाजून या गावापासून सुमारे 8 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर विस्तीर्ण कातळावर आत्माराम धुमक यांनी कातळशिल्पांचा समुह दाखविला तेव्हा सारे यात्रेकरू अक्षरश: अचंबित झाले. अत्यंत सुबक, ठाशीव, सुस्पष्ठ अशा अनेक आकृत्या एकाच ठिकाणी पाहून सारे कुतूहलात दडले. काही आकृत्यांचा अर्थबोध होत होता, तर काही गुढ होत्या.
रेड्याचे 8 फुटांचे पाऊल.
अद्भूत रेडेबावलं
यावेळी बोलताना आत्माराम धुमक म्हणाले की, या जागेला ‘रेडेबावलं’ असे म्हणतात. या कातळशिल्पांच्या शेजारीच एक शेतजमीन आहे. या शेतजमीनीत मोठ्या प्रमाणात नाचणी, वरी, भातशेतीचे उत्पादन पुर्वी घेतले जाई, मात्र प्राचीन काळी एकेवर्षी लावणी करत असताना केलेल्या चिखलात बारा रेड्यांची जोते, बारा नांगर्यांसह रुतली, आणि गतप्राण झाली, आणि तेव्हापासून या जागेला गुढ वलय निर्माण झाले. म्हणून या जागेला रेडेबावलं म्हणतात.
रेडयांची मोठाली पावलं
या कातळशिल्पांचे निरीक्षण करता याठिकाणी रेडे किंवा घोडा यांच्या पायांचे ठसे कोरलेले दिसून आले. काही ठसे हे छोटे, काही मध्यम तर काही मोठाले कोरलेले आहेत. मोठाल्या पावलांची लांबी 8 फूट, आणि रुंदी 6 फूट इतकी आढळून आली. अशी दहा पावले सुस्थितीत दिसून आली. एका पावलाशेजारी ‘भाला’ या शस्त्राची आकृतीही कोरलेली दिसून आली. याशिवाय मानवाची पावलंही आढळून आली आहेत. मानवी पावलांची संख्याही 10 आहे. ती चांगली खोलगट असून, काही ठिकाणी जोडपावलं, तर काहीठिकाणी चालीची पावलं रेखाटलेली आहेत. या सार्या पावलांची दिशा ही पश्चिमेकडे जाताना दिसत आहे.
तीन लंबाकृती प्राणी
याशिवाय तीन प्राणीही चितारलेले आहेत. तिन्हीही प्राणी लंबाकृती आहेत. एकाचे तोंड निमुळते आहे. त्यांच्या डोळ्यांची खोबणी खोलगट आहे. एक प्राणी विमानाच्या आकृतीसारखा आहे. एक माशासारखा प्राणी आहे. एक शंखाकृती आकृतीही आहे. एक मडकेही चितारलेले आहे.
गुढ चावीकृती आकृत्या
या सार्या आकृत्यांमध्ये दोन आकृत्या या ‘चावी’ आकाराच्या आहेत. दोन्ही चाव्या मोठाल्या आहेत. चावीचा पुढील काडीचा लांब भाग 6 फूट लांब आहे. चावीचा मागील भाग आयताकृती आहे. हा आयतही 6 फूट लांब आणि 4 फूट रुंद आहे. या आयताच्या मध्यभागी 2 चौकोन असून त्यामध्येही काही आकृतीबंध काढण्यात आलेले आहेत. अशी एकूण 30 चित्रे दृष्टीपथात आली, प्रत्यक्षात त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता दाट आहे. काही ठिकाणी गवत रुजल्यामुळे ती झाकली गेली आहेत, मात्र काही ठिकाणी त्यांची सुस्पष्ठता, सुबकता आणि रेखीवपणा नजरेत भरण्यासारखा आहे.
रानमानसाचा सन्मान
पदयात्रेत सहभागी झालेल्या तरूणांनी सुरूवातीला सर्व रेखाचित्रांची स्वच्छता केली. त्यानंतर काही अस्पष्ठ होणार्या चित्रांचे रंगाने रेखाकंन केले. त्यानंतर या चित्रांचे निरीक्षण करून चित्राकृतींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. रेड्यांच्या पावलांची चित्रे म्हणूनही कदाचित या परिसराला ‘रेडेबाऊल’ असे नाव पडले असेल, असाही तर्क तरूणांनी व्यक्त केला. पदयात्रेच्या शेवटी पदयात्रेतील संस्थापक सदस्य श्री.अनंत धुमक यांनी रानमाणूस वाटाडे श्री.आत्माराम धुमक यांचा श्रीफळ, वस्त्र देऊन सन्मान केला, व सहकार्याबद्दल धन्यवाद मानले.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे संकल्पक अमोल पालये, मारूती धुमक आणि अनंत धुमक यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत सुरज माने, निखिल पालये, रोशनी पालये, तेजस्विनी पालये, वेदिका तांबे, तनिष्क लोखंडे, आत्माराम धुमक आदी. सहभागी झाले होते.
ग्रामपंचायतीला साकडे
या कातळशिल्पांची ओळख सर्वदूर व्हावी, यासाठी कातळशिल्प शोधयात्रा पदयात्रींनी सडये-पिरंदवणे-वाडाजून गु्रप ग्रामपंचायतीला निवेदन सादर केले आहे. कातळशिल्पांचे संवर्धन व्हावे, त्याठिकाणी संरक्षक कठडे बांधावेत, मुख्य मार्गावर फलक लावण्यात यावे, अशा मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
दापोलीत आढळले दहा हजार वर्षापूर्वीचे कातळशिल्प, एलियनसदृश्य कातळशिल्पाबाबत कुतूहल
ऑनलाइन लोकमत
~2 minutes
शिवाजी गोरे
दापोली : तालुक्यातील उबर्ले गावात एलियनसदृश्य कातळशिल्प आढळल्याने हे गाव चर्चेत आले आहे. हे कातळशिल्प १० हजार वर्षापूर्वीचे असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. अशा प्रकारचे कातळ शिल्प अन्यत्र कोठेही आढळलेले नसल्याचेही अभ्यासकांनी सांगितले.
उंबर्ले गावात 'गाढवाचा खडक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांभ्या सड्यावर शिल्पसमूहात सहा कातळशिल्पे आढळली आहेत. यात एका मानवाकृतीसोबत तीन हरणे व दोन बैल या प्राण्यांची चित्रे आहेत. मानवाकृती सुमारे साडेचार मीटर लांबीची आहे. तिच्या डोक्यावर शिरस्त्राण अथवा पागोट्यासारखा आकार असून त्यावर झाडाच्या सरळ फांदीसारखी रचना दिसते.
कोकणात आतापर्यंत आढळलेल्या कातळशिल्पांमध्ये बैल हा प्राणी आढळला नव्हता. शिंग आणि वशिंडधारी असे हे दोन बैल आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे आजपासून किमान पाच दहा हजार वर्षांपर्यंतच्या काळातील असावीत, असा अंदाज करता येतो. बैल हा प्राणी असल्याने, या शिल्पांचा कालावधी हा नवाश्मयुगीन, म्हणजे मानवाला शेतीचा शोध लागला त्या काळातील असावा, असा अंदाज आहे. अर्थातच यासाठी सूक्ष्म अभ्यासाची गरज असल्याचे डॉ. धनावडे यांनी नमूद केले.
रहस्य उलगडणार
आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीतदापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक आहे. तर मंडणगड तालुक्यातही कातळशिल्पाचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. डॉ. अजय धनावडे यांनी या ठिकाणी भेट देत, त्यांची मोजमापे, छायाचित्र घेत अभ्यास सुरू केला आहे. यामुळे या कातळशिल्पांचे रहस्य उघडणार आहे.
इथे होकायंत्र काम नाही करत। कोकणातील एक अद्भुत ठिकाण आणि रावणाचं कातळशिल्प - देवाचे गोठणे ,राजापूर
कोकण आणि कोकणातील कातळशिल्प
कोकण हे राज्यांतील सर्वात चांगलं पर्यटन स्थळ आहे. कोकणातील समुद्र किनारे, या ठिकाणची खाद्य सांस्कृती, सिंधुदुर्ग किल्ला, स्थानिक लोक यामुळे कोकणात पर्यटकांना यावसं वाटतं.कोकणातील पर्यटन मध्ये आता कातळशिल्प यांचं महत्व वाढताना आता आपल्याला दिसतंय.कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो कातळशिल्पांचा शोध लागला आहे आणि पुढे जाऊन हा आकडा वाढू शकतो.
कोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर म्हणजे कातळावर आढळणारी कातळशिल्पे हे आजही एक मोठे गूढ आहे. विविध चित्रे आणि अगम्य अशा आकृत्या व भाषा यांनी ही शिल्पे समृद्ध आहेत आणि ती कोणी आणि नेमकी केव्हा खोदली याचा उलगडा अजूनही झालेला नाही! कोकणातील, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यात असलेला जांभा खडक या शिल्पांसाठी अगदी आदर्श असावा असे या भागात सुरू असलेले संशोधन सुचविते.
कोकण आणि गोव्यात आढळणारी ही चित्रे आणि आकृत्या कोणी आणि कधी काढल्या असाव्यात याची नेमकी कालगणना आज तरी उपलब्ध नाही. काहींच्या मताप्रमाणे ही कातळ चित्रे इ.पू. १० ते १२ हजार वर्षे जुनी असावीत. इथल्या दुय्यम (Secondary) जांभा पठारावर ही शिल्पे आढळतात. आज अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणात किंवा नवीन इमारतींच्या बांधकामामुळे काही दुर्मीळ शिल्पे गायब झाली आहेत व होत आहेत.
रत्नागिरी जिल्यातील राजापूर तालुक्यातील एक सुंदर गाव देवाचे गोठणे.देवाचे गोठणे या गावचा इतिहास येथील भार्गवराम मंदिर जे सुमारे 450 वर्ष जून असू शकत त्यावरून या गावचा इतिहास प्रत्ययास येतो . भार्गवराम म्हणजेच परशुराम यांचं हे मंदिर जून आहेच पण देखणं ही आहेच . मंदिरायच्या परिसरात एक दगडी अष्टकोनी दीपमाळ आहे . देवासाठी हे आग इनाम म्हणून मिळाले त्यामुळे गावच नाव देवाचे गोठणे .
या गावात सड्यावर(माळरानावर ) एक वेगळंच आश्चर्य आपल्याला पहायला मिळत . सद्याच नाव आहे रावणाचा सडा. या सड्यावर रावणाची छाप देखील आहे.दंतकथा अशी आहे की जेव्हा रावण सीतेला घेऊन जात होता तेव्हा तो तिकडे अडकून पडला आणि त्याची ती आकृती तयार झाली . पण खरं तर ते एक कातळशिल्प आहे . Petroglyphs अस त्यांना संबोधलं जात पण हे petroglyphs लेण्यांमध्ये, भिंतीवर एक उभ्या दगडात कोरलेलं असतात पण कोकणात माळरानावर कातळात कोरलेले पहायला मिळतात . अनेक अशी कातळखोद शिल्प प्राणी पक्षी अनेक अश्या आकृत्या ज्यांच्या कडे बघून अस वाटतच नाही की हे सर्व तेव्हा असेल पण ते आपल्या पूर्वजांना किंव्हा आदिमानवाना कस काय माहित.तरीपण हा आपला ठेवा आहे तो आपण जपला पाहिजे ☺️
या रावणाच्या कटाळशिल्पचं एक वैशिष्ट्य आहे इकडे होकायंत्र (Compass) चालत नाही त्या कातळशिल्प वर कुठेही होकायंत्र ठेवलं असता दिशा वेगवेगळ्या दिसतात , आणि यालाच चुंबकीय विस्थापन म्हणतात . या magnetic field मुळे हा चमत्कार होतो ,पण हे सर्व तेवढ्याच भागात होत.
बाकी सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वरती मिळेल
त्या काळातील गुगल नकाशे
ते मानवी जगण्याचे साधन होते
तुम्हाला अनेकदा दगडी गोळे जवळपासही आढळतील.
गोळे - खगोलीय संरेखन, मोजमाप, गणना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाचा भाग आहेत आणि नेव्हिगेशनसाठी वापरले जात होते.
त्यांनी त्यांचा वापर शस्त्रे म्हणून देखील केला असेल (जर ते पुरेसे मोठे असतील तर) आणि पराभव आणि विजयाचे चिन्ह म्हणून ते एकमेकांपासून चोरले असतील.
एकाच गटात एकत्र सापडलेले बरेच जण व्यापारासाठी होते
कदाचित मोठ्या भागात पसरलेले बरेच जण कदाचित युद्धस्थळ होते (मृतांचे अवशेष)
लहान आणि तुरळक आढळलेले ते कदाचित वैयक्तिक आणि वैयक्तिक वापरासाठी होते.
विणलेल्या दोरीने किंवा कदाचित आतडे किंवा चामड्याने पण काठीने बनलेला दगड.
याचा वापर सर्वेक्षण आणि वेळेचे निरीक्षण करण्यासाठी केला जात असे जे नंतर नेव्हिगेशनमध्ये आणि बांधकाम करताना पातळी निश्चित करण्यासाठी मदत करते.
उर्वरित उपकरण कदाचित खूप पूर्वीपासून गायब झाले आहे, जरी तुम्हाला काय शोधायचे हे माहित असेल तर अजूनही काठीची कलाकृती असू शकते... त्यांच्या जवळ/सोबत काहीतरी धातू आढळू शकते (कोरीवकाम केलेले हाड देखील).
पण ते उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम... आणि क्षैतिज, उभे आणि कर्णरेषा एकत्र करून रेखावृत्त इत्यादी शोधण्यास मदत करते.
प्रथम उत्तर तारा (ध्रुव तारा) ओळखण्याच्या आधारावर काम करते कारण तो आकाशात जवळजवळ नेहमीच अचूक असतो.
गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या नॉर्थ क्वीनच्या चेंबर शाफ्टमध्ये एकाचे अवशेष सापडले.
ते जगभरात हजारो वर्षांपासून वापरात होते कारण ते सर्वत्र आहेत
असे दिसते की शिकारी-संग्रह भटक्या विमुक्त असतील परंतु ते इतरांपेक्षा खूप प्रगत होते.
त्याला मेर्खेत म्हणतात... आणि ते मुळात सेक्स्टंटसारखे आहे.
इजिप्शियनमध्ये एका लाकडाच्या तुकड्यासह आला होता जो "गायब" झाला आहे आणि जसे तुम्ही अपेक्षा करता आणि कार्बन१४ चा विचार करता... ते संरचनांच्या खऱ्या तारखांवर बरेच कट रचते.
चेंडूंवरील कोणताही सजावटीचा परिणाम कदाचित अंशतः फक्त वैयक्तिकृत आणि सजावटीचा असेल... आणि तुमचे स्वतःचे साधन ओळखण्यायोग्य बनवेल... कदाचित त्याच्याभोवती दोरी बांधून लटकण्यास मदत झाली असेल.
तर हेंजेस - ते कुटुंबे आणि समुदायांसाठी एक मध्यवर्ती केंद्र आहेत
- प्रवाशांसाठी एक विश्रांती बिंदू देखील आहे जिथे नकाशा, घड्याळ आणि वार्षिक कॅलेंडर सर्व एकाच वर्तुळात आहे.
एका रात्री इकडे तिकडे भटकंती करणे आणि फक्त तारे आणि दिशानिर्देशांचे संरेखन केल्याने येणाऱ्या हवामानाचा, शिकारीसाठी प्राण्यांचे स्थलांतर इत्यादींचा दीर्घकालीन अंदाज येत नाही...
म्हणून तुम्हाला ती सर्व माहिती दर्शविणारी अधिक कायमस्वरूपी रचना हवी असेल.
ते दगडांपासून बनलेले होते आणि विशेषतः त्या ठिकाणी दगड आणले होते ही वस्तुस्थिती दर्शवते की तो परिसर किती महत्त्वाचा होता, संरचना किती महत्त्वाच्या होत्या आणि त्या त्यांच्या टिकाऊपणावर - टिकून राहण्यावर किती अवलंबून होत्या.
जर तुम्हाला ते कसे वाचायचे हे माहित असेल... मध्यभागी उभे राहून सूर्य कुठे आहे आणि सावल्या कुठे पडतात हे पाहत असाल तर तुम्हाला दिवसाची वेळ कळेल... रात्रीही तारे वापरून आणि दिशा दाखवण्यासाठी... तुम्हाला संक्रांती आणि विषुववृत्तांद्वारे विशिष्ट ऋतू किती अंतरावर आहे हे कळेल.
आणि जर तुम्हाला ऋतू माहित असतील... तर तुम्हाला कळेल की थंडी कधी सुरू होते आणि हिवाळा कधी येतो... किंवा वसंत ऋतूमध्ये तुम्हाला कळेल की अन्नाचे स्रोत पिकत आहेत/उपलब्ध आहेत... स्थलांतराचे प्रकार आणि प्राण्यांच्या शिकारीच्या वेळा... आणि तुम्ही त्या दिशेने पुढे जाल,
त्यांना जे काही जाणून घ्यायचे आहे ते सांगेन.
या वास्तू प्रत्यक्षात सूचित करतात की त्या निश्चितच भटक्या, शिकारी गटांनी बांधल्या होत्या
गोबेकली टेपे प्रमाणेच... हे हेंगे आहे... ती वास्तू आधी बांधली गेली (त्यांना हे माहित आहे) आणि शेती नंतर आली
पुन्हा... जगण्याची पहिली गरज ... स्थानाची पहिली गरज ... अन्न, पाणी, निवारा आधी उपलब्ध आहे नाहीतर तुम्ही मराल.
जर उत्तर स्तंभ नसेल तर ज्या तेजस्वी ताऱ्याशी ही रचना जुळवली आहे ती निश्चितपणे तारीख ठरवण्यास मदत करेल आणि ती करणे खूप सोपे आहे - पुरातत्वशास्त्र
प्रवास मार्गांवर कायमस्वरूपी बांधकामे जी तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती दर्शवितात आणि रात्री-अपरात्री सर्वकाही संरेखित न करता, परंतु म्हणूनच ते खगोलशास्त्रीयदृष्ट्या रांगेत असतात आणि वेळोवेळी जोडले गेले असते.
लोक कदाचित दिवसा तिथे राहिले असते... पण कदाचित रात्री प्रवास करत असतील जेणेकरून ते हरवू नयेत
आणि समुदाय कदाचित अधूनमधून तिथे जमत असतील... कदाचित तुम्हाला काहीतरी फॅन्सी हवे असेल तर अन्न, कातडे, अगदी सजावटीचे गोळेही देवाणघेवाण करत असतील... आणि/किंवा वार्षिक शिकारींना समन्वित आणि आदरांजली वाहत असतील... संभाव्य जोडीदारांना भेटू शकले इत्यादी
बहुउद्देशीय
हेंगेजच्या जवळ, आत किंवा आजूबाजूला लोक जमल्याचे इतर कोणते पुरावे जसे की व्यापार/कॅम्पिंग/शेताळे इत्यादी आढळतात याबद्दल मला पुरेशी माहिती नाही, परंतु मी असे सुचवेन की ते नक्कीच जवळ असेल.
दगडांच्या लेआउटमध्ये (किंवा कोरीवकाम देखील) इतर माहिती असू शकते जी उदा. विशिष्ट दिशेने पाण्याची उपलब्धता... आणि पुढील बांधकामापर्यंतचे अंतर इत्यादी दर्शवू शकते.
उदाहरणार्थ, लिंटेल... त्या दिशेने जाऊ नये असे सूचित करू शकते कारण तेथे काहीही नाही किंवा जर तुम्ही असे केले तर त्या दिशेने छावण्या आणि निवारा उपलब्ध आहेत.
तुलनेने जवळच्या दोन हेंगे आणि त्यामधील कोणत्याही खुणा यांच्यामधील माहिती (खडकांची जागा आणि कोरीवकाम आणि वस्त्यांचे पुरावे) तुलना करणे त्यांना अधिक समजून घेण्यास मदत करेल.
मूलभूत बांधकामे ही एकतर लोक स्थलांतरित झाल्यावर केलेली पहिली बांधकामे होती... इतरांकडे जलद थांबे... किंवा चांगली जागा सापडल्यावर ती अजिबात पूर्ण झाली नाहीत.
ते जितके अधिक गुंतागुंतीचे होते... लोक सामान्य क्षेत्रात जास्त काळ होते कारण तेथे अधिक नैसर्गिक संसाधने उपलब्ध असती आणि त्यांना राहण्याचे कारण होते.
जर हेंगे साइटवर लोकसंख्या नैसर्गिक संसाधनांपेक्षा जास्त असेल... किंवा काही कारणास्तव परिसर नैसर्गिकरित्या बदलला असेल तर तुमच्याकडे पुढे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
पण एकदा लोक पिके/प्राणी शेती करायला शिकले की तुम्ही कायमस्वरूपी घरे बांधू शकता आणि खरोखरच त्याची गरज भासणार नाही (हेंगे) पण दैनंदिन नेव्हिगेशनसाठी तुम्हाला अजूनही तुमच्या मर्खेतची आवश्यकता असेल.
हा माझा सिद्धांत आहे ज्याचा दुर्दैवाने एलियन्सशी काहीही संबंध नाही
गोकर्ण महाबळेश्वर येथील शिळावर्तुळ
Usgalimal Goa
Discovering Goa’s Ancient Secret ✨ Goa is known for its beaches, but did you know it’s also home to one of India’s richest rock engraving sites? Located on the serene banks of the River Kushawati in Sanguem Taluka, this historic site showcases stunning prehistoric petroglyphs — from human and animal figures to a striking labyrinth (चक्रव्यूह) pattern. In Marathi, we call these carvings “कातळशिल्प”, and they’re believed to be thousands of years old, offering a rare glimpse into the minds and lives of our ancestors. A truly unique, informative, and awe-inspiring place that proves Goa is more than just sand and sea. “Far from the crowds, yet so close to our roots
सिंधूसंस्कृती आणि महाराष्ट्रातल्या आद्य वसाहती
हडप्पा संस्कृती ते जोर्वे संस्कृती
सिंधूसंस्कृती म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने येतात ती आताच्या पाकिस्तानमधे उदयाला आलेली आखीवरेखीव नियोजनबद्ध शहरं आणि भरभराटीचा व्यापार. पण त्यावेळी भारताच्या इतर प्रदेशांमधे, विशेषतः महाराष्ट्रात, काय परिस्थिती होती? इथल्या लोकसमूहांची जीवनशैली कशी होती? सिंधूसंस्कृतीचे आणि त्यांचे काही आपसात संबंध होते का? एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडलेले असतात. त्यातल्याच काही प्रश्नांचा थोडक्यात घेतलेला हा मागोवा...
सिंधू संस्कृती (इ.स.पू. २५००- इ.स.पू. १७००) :
नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते. मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते. आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. भारतामधील नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीची उत्तम उदाहरणे म्हणजे प्राचीन सरस्वती नदीकाठी वसलेले कालीबंगन येथे ‘घग्गर’ संस्कृतीचे अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात.
या नद्यांच्या काठी मानवी संस्कृती वसत गेली आणि मानवाचा विकास होत गेला हे आपल्याला या नद्यांच्या काठावर आढळणाऱ्या मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून समजते. प्रागैतिहासिक काळापासून या संपूर्ण खोऱ्यामध्ये विविध संस्कृती नांदल्या आणि विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रात उदयाला आल्या असे आपल्याला दिसते.
इ.स.पूर्व दहा ह्जार वर्षांपासून वायव्येकडून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरितांचे आगमन सतत होत आलेले आहे. या स्थलांतरितांनी आपली संस्कृती सिंधू–सरस्वती खोर्यांत स्थापन केली. ही संस्कृती इ.स.पूर्व २००० पर्यंत अबाधित राहिली. या लोकांचा दख्खनच्या पठारावर राहणार्या आणि मूलतः मलै द्वीपकल्प किंवा अंदमान–निकोबार बेटे येथून आलेल्या लोकांशी फारसा काहीच संबंध न आल्याने त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार झाले नाहीत व त्यांची संस्कृती दख्खनच्या पठारावरील लोकांपेक्षा भिन्न राहिली. या अहवालात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यामधील जनुकीय मिश्रण या कालापर्यंत झालेले आढळून येत नाही.
सुमारे दहा लाख चौरस किलोमीटर पसरलेल्या नागरी सिंधू संस्कृतीच्या सीमा पाकिस्तान-इराणच्या सीमेपासून ते गुजरातपर्यंत विस्तारलेल्या होत्या. आजच्या भारतासारखीच जशी अवाढव्य शहरं होती तशीच छोटी खेडेगावं, वाड्या-वस्त्या पण होत्या. शहरी व्यापार्यांपासून भटक्या मेंढपाळापर्यंत सगळ्या प्रकारचे लोक या भूभागात परस्परसान्निध्यात रहात होते. सिंधूसंस्कृतीच्या नागरी कालखंडात (इ.स.पू. २६०० - २०००) भारतीय उपखंडाच्या बहुतेक सर्व प्रदेशांमधील लोकसमूह भटक्या शिकारी जीवनाकडून स्थायी शेतकरी जीवनाकडे वाटचाल करत होते असं दिसतं. यातल्या शेजारपाजारच्या लोकसमूहांशी सिंधूसंस्कृतीचे देवाणघेवाणीचे संबंध होते याचे पुरातात्त्विक पुरावेही उपलब्ध आहेत.
सुमारे ५००० वर्षांपूर्वी जगातील प्रमुख चार नद्यांच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झाल्या. यामध्ये तैग्रीस आणि युफ्रेटिस नक्ष्यांच्या काठी मेसोपोटेमिया संस्कृती, नाईल नदीकाठी इजिप्तची संस्कृती, सिंधू नदीच्या काठी सिंधू संस्कृती आणि हो-हँग-हो नदीच्या काठी चिनी संस्कृतीचा उदय झाला. नद्यांच्या किनाच्याजवळील गाळाची व सुपीक मृदा, शेतीस योग्य वातावरण व पाण्याचा उपयोग करून मानवाने शेतीतून अन्नोत्पादने वाढवली. अन्नधान्यांचे अतिरिक्त उत्पन्न वाढल्याने काही मानवांनी शेती कार्यास पूरक व्यवसाय, घरांची निर्मिती, धातू उद्योग अशा प्रकारचे कार्य करण्यास सुरुवात केली. या वस्तूंच्या देवाण-घेवाणीसाठी ग्रामीण समुदायात राहणारा मनुष्य मोठ्या संख्येने एकत्र येऊन राहू लागला व यातूनच नागरी संस्कृतीची निर्मिती झाली.
सिंधू संस्कृतीचा शोध : -
सिंधू संस्कृतीचा पहिला उल्लेख चाल्र्स मेसन यांनी १८२६ मध्ये केला; परंतु सिंधू संस्कृतीची खरी ओळख १९२०-२१ साली लाहोर-मुलतान रेल्वेसाठी खोदकाम करताना सापडलेल्या विटा, मुद्रा व इतर पुरातत्त्वीय अवशेषांमुळेच झाली. जॉन मार्शल, राखालदास बॅनर्जी, दयाराम सहानी, माधव स्वरूप वत्स इ. पुरातत्त्व विद्वानांच्या परिश्रमपूर्वक उत्खननामुळे एका अतिप्राचीन संस्कृतीचा शोध लागला. दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये या संस्कृतीतील ‘हडप्पा' शहराचा उत्खननातून शोध लावला. हडप्पा' हे शहर सिंधू संस्कृतीमधील सर्वप्रथम उत्खननीत स्थळ असल्याने व सिंधू संस्कृतीच्या इतर उत्खननित शहरातील सर्वच लक्षणे या शहरात आढळत असल्याने सिंधू संस्कृतीलाच 'हडप्पा संस्कृती' असे ही म्हणतात.
स्थान-विस्तार : -
पूर्वेस आलमगीरपूर, पश्चिमेस सुत्केगेंडोर, दक्षिणेस महाराष्ट्रातील दायमाबाद व उत्तरेस जम्मूमधील मांडा अशा याच्या सीमा आहेत. पूर्व पश्चिम १६०० किमी व दक्षिण उत्तर ११०० किमी याची लांबी, रुंदी असून एकूण १२,९९,६०० चौकिमी भारताचा भाग याने व्यापला आहे. पंजाब, राजस्थान, गुजरात, बलुचिस्तान, हरियाणा व महाराष्ट्र इत्यादी प्रदेशात या संस्कृतीचा विस्तार झाला आहे.
सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये : -
हडप्पा, मोहनजोदडो, रंगपूर, सुरकोटडा, कालीबंगन, रोपड, दायमाबाद, मेहरगढ, चहूदंडो, ढोलवीरा अशा ४०० हून अधिक ठिकाणच्या उत्खननित अवशेषांवरून सिंधू संस्कृतीची पुढील काही वैशिष्ट्ये दिसून येतात.
१) सिंधू संस्कृती ही कास्ययुगीन संस्कृती आहे.
२) ही एक नागरी व व्यापार प्रधान संस्कृती आहे.
३) सिंधु संस्कृतीमध्ये सामाजिक व धार्मिक वैमनस्यांचा अभाव आहे.
४) अन्य संस्कृतीशी सिंधू संस्कृतीचे व्यापारीक संबंध असल्याचे उत्खननीत पुराव्यांवरून समजते.
५) सिंधू संस्कृतीमधील लोकांना लिपीचे ज्ञान होते.
६) सिंधू संस्कृती ही एक शांतताप्रिय संस्कृती होती.
७) सिंधू संस्कृतीमध्ये मंदिरांचा अभाव दिसून येतो.
८) सिंधू संस्कृतीमधील वजनमापात समानता दिसून येते.
९) सिंधू संस्कृतीच्या सर्व नगरांना तटबंदी होती. .
१०) सिंधू संस्कृतीमध्ये नगर नियोजनास महत्त्व होते.
सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे : -
सिंधू संस्कृतीच्या -हासांच्या कारणाबाबत इतिहासकारांनी विविध मते नोंदवली आहेत. काही इतिहासकारांच्या मते, हवामानातील बदल, सिंधू नदीच्या प्रवाहाच्या दिशेत बदल, सततचा दुष्काळ यामुळे लोकांनी स्थलांतर केले असावे. त्यामुळे या संस्कृतीचा -हास झाला असावा. तसेच काही इतिहास संशोधकांनी आर्यांच्या आक्रमणामुळे, व्यापारातील मंदीमुळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही संस्कृती नष्ट झाली असावी, असे मत नोंदवले आहे. सुमारे इ. स. पू. १७५० च्या दरम्यान सिंधू संस्कृतीचा -हास झाला असावा.
महापाषाणयुगीन संस्कृती (Megalithic Age) :
'Megas' म्हणजे मोठा व 'litho' म्हणजे दगड या दोन शब्दांपासून Megalith म्हणजेच मोठा दगड हा शब्द बनला आहे. मृत्यूनंतर मृताच्या दैनंदिन व आवडीच्या वस्तू त्यासोबतच पुरल्या जात व याजागी त्याची स्मृती म्हणून एक मोठा दगड किंवा दगडाचा ढीग विशिष्ट पद्धतीने ठेवला जाई. दफनासाठी वापरलेल्या या पाषाणाच्या विशिष्ट पद्धतीमुळे या कालखंडाला ‘महापाषाण युग असे म्हणतात. महाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ हा इ. स. पू. १००० वर्षांपूर्वीचा आहे. ही एक लोहयुगीन संस्कृती आहे. महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील रंजाळा, जळगाव जिल्ह्यातील बहाळ, टेकवाड़े तसेच नागपूर जिल्ह्यातील माहरझरी इ. ठिकाणी याचे अवशेष प्राप्त होतात.
हाराष्ट्रातून प्राप्त महापाषाण उत्खननाद्वारे या काळाची पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात.
१) या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात, खड्ड्यात व शवपेटीत ठेवल्याचे अनेक सांगाडे उत्खननातून प्राप्त होतात.
२) मृताबरोबर लोखंडी भाले, तलवारी, कट्यारे, कु-हाडी अशा हत्यारांचे अवशेष प्राप्त झाले आहेत.
३) गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, तांदूळ यांचे उत्पादन या काळात घेतले जाई.
४) कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिण, रानडुक्कर, बकरा इ. प्राण्यांचा मांसाहारासाठी वापर केला जाई.
५) या काळातील मानव मातीच्या घरात, कच्च्या विटा व कुडांनी बांधलेल्या घरात राहात असत.
६) या काळातील मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत असत.
७) विदर्भातील नैकुंड येथे लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. यावरून धातू व्यवसाय हा या काळात मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे संकेत प्राप्त होतात.
८) या काळातील मानवांनी शेतीबरोबरच पशूपालनासही महत्त्वदिले होते.कुंभाराच्या चाकावर मृदभांडी बनवणे, त्यावर चित्रकला, नक्षीकाम व भाजून पक्के बनवणे यामध्ये ते कुशल असल्याचेपुरावे मिळतात.
९) काच, दगडी मणी, नीलमणी यांचाही वापर अलंकार म्हणून करत असत.
ताम्रपाषाण युग ( Chalcolithic Age)
सिंधू–सरस्वती खोर्यांतील जलस्त्रोत जसजसे आटू लागले तेंव्हा येथील रहिवाशांनी पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे स्थलांतर चालू केले. या कालात इनामगाव सारख्या अनेक वस्त्या निर्माण झाल्या असणार.
दख्खनचं पठार मात्र या सांस्कृतिक देवाणीघेवाणीच्या मुख्य धारेपासून थोडंसं दूर होतं. महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख दख्खनच्या पठारावर रहाणार्या मानवसमूहाला झाली असं दिसतं. सर्वात प्रथम तापीच्या खोर्यात, खानदेशात या वसाहती उदयाला आल्या असं दिसतं. सुरुवातीची गावं हंगामी होती, जितकी शेतीवर तितकीच शिकार आणि पशुपालनावर अवलंबून होती. अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले. आजवर महाराष्ट्रात अशी सुमारे दीडशेच्यावर स्थळं उजेडात आली आहेत. या लोकसमूहांना अजून लोहतंत्रज्ञान अवगत झालेलं नव्हतं. फक्त तांबं आणि दगड यांचा वापर ते करत असत म्हणून त्यांना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं म्हणलं जातं.
सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा करून त्यावर झोपडी बांधून रहात असत. त्यांची मातीची भांडी फारशी पक्की भाजलेली नसत. लाल रंगावर काळ्या-तपकिरी रंगाची नक्षी किंवा काळ्या रंगावर लाल नक्षी काढलेली असे. यात विविध प्राणी, पक्षी, शस्त्रास्त्रं अशी चित्रसंपदा आढळते. मात्र सुमारे इ.स.पू १८०० च्या आसपास या वसाहतींमधे सांस्कृतिक बदल झालेले दिसायला लागतात. परत एकदा गुजरातमधल्या वसाहती याला कारणीभूत होत्या.
सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याला या दख्खनच्या आद्य वसाहती आढळायला लागतात. सुरुवातीला बहुदा हंगामीच असणारी छोटी छोटी गावं, वाड्या पुढच्या हजार वर्षांत व्यवस्थित स्थिरावतात. पूर्ण दख्खनभर अशी अनेक स्थायी गावे, त्यांना संलग्न/ स्वतंत्र अशा हंगामी वाड्या-वस्त्या पसरलेल्या होत्या असे दिसते. नदीनाल्यांच्या काठाला, काळ्याकरंद सुपीक जमिनीच्या सान्निध्यात, चराऊ कुरणांच्या जवळपास, कधीतरी गारगोटीचे दगड जिथे विपुल प्रमाणात मिळतात त्या ठिकाणाच्या आसपास अशा विविध प्रकारच्या परिसरांमध्ये या लोकसमूहांचा वावर होता. पण दख्खनचे पर्यावरण, पाऊसमान तेव्हाही आजपेक्षा फार वेगळे नव्हते. तेव्हाही दख्खन अर्धदुष्काळीच होता. त्यामुळे बहुतेक गावं वसवताना साहजिकपणेच जलस्रोतांशी सान्निध्य हा एक महत्वाचा निकष होता असे दिसून येते.
लोखंड गाळायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. तांबे आणि दगड यांची हत्यारं औजारं वापरली जात असत. म्हणूनच त्यांना पुरातत्वात ताम्रपाषाण युग असे म्हणले जाते. शेती, पशुपालन, शिकार, मासेमारी, जंगलातून फळे कंदमुळे इत्यादि गोळा करणे यावर या समाजांची उपजीविका होत असे. आपसात देवाणघेवाणही होतच असे. पार कर्नाटक आणि गुजरात राजस्थानपर्यंतच्या प्रदेशांशी यांचे देवाणघेवाणीतून संपर्क होते. मात्र नाणी नव्हती, चलनव्यवस्था नव्हती, शहरे नव्हती, राजसत्तेची चौकट नव्हती आणि बांधीव शासनयंत्रणाही नव्हती. फक्त कुटु़ंब आणि कुल यांच्या चौकटीत वावरणारे हे समाजगट होते आणि आपसातच गावप्रमुखांद्वारे कारभार चालत असे.
सुमारे इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला लागली आणि सगळा समाज परत एकदा ग्रामीण संस्कृतीकडे परतला. गुजरातेतल्या सिंधू संस्कृतीच्या वसाहतीही याला अपवाद नव्हत्या. तिथे आधीपासूनच असलेल्या स्थायी शेतकरी वसाहती आता पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे अर्धभटक्या पशुपालक झाल्या आणि चराऊ कुरणांच्या शोधात सोनगढच्या खिंडीतून खानदेशाकडे येऊ लागल्या. आणि त्यांच्याशी असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून, त्यांच्या इथे झालेल्या स्थलांतरातून सिंधूसंस्कृतीच्या जीवनशैलीचा प्रभाव खानदेश आणि प्रवरेच्या खोर्यात असलेल्या लोकसमूहांवर झालेला दिसतो.
सिंधू संस्कृतीच्या उत्तर काळात महाराष्ट्रातील काही भागात तांब्याचा वापर करून कृषीप्रधान संस्कृती निर्माण झाल्या. या काळातील अवजारे व हत्यारे ही ताम्र (तांबे) व पाषाणांच्या संयुक्त वापराने बनवलेली असल्याने या कालखंडाला ‘ताम्रपाषाण युग' असे म्हणतात.
महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळे व कालखंड : - प्रकाशे, नेवासे, चांदोली, सोनगाव, टेक्वाडे, सावळदे, दायमाबाद, बहाळ अशा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष प्राप्त झाले आहेत व याचा कालखंड सुमारे इ. स. पू. २२०० ते इ. स. पू. १००० असा मानण्यात येतो. पुरातत्त्व विद्वानांनी उत्खननीत ताम्रपाषाण युगीन स्थळांचे सावळदा संस्कृती, उत्तर सिंधू, दायमाबाद, माळवा व जोर्वे संस्कृती असे विभाजन केले आहे.
ताम्रपाषाण युगाची वैशिष्ठ्ये : -
१) गृहरचना - ताम्रपाषाण संस्कृतीच्या लोकांची गृहरचना उत्कृष्ट व योजनाबद्ध होती. ही घरे आयताकृती तसेच गोलाकार असत.यातील आयताकृती घरे कुडाच्या भिंतींची असते. तर गोलाकार घरे झोपड्यांसारखी असत.घरासाठी भाजलेल्या विटांचा वापर केला जाई.
२) उत्खननीत भांड्यामध्ये गोलाकार भांडी, वाडगे, लोटा, उथळ तळाची भांडी मिळतात. त्यावर हरिण, मोर, चित्ता, बैल, पक्षी इत्यादींची चित्रे काढलेली आढळतात.
३) हत्यारे - ताम्रपाषाण युगीन लोकांनी दगड व हाडांच्या बरोबरच हत्यारे व अलंकार बनवण्यासाठी तांब्याच्या धातूचा वापर करण्याचे तंत्र विकसित केले. चालकोपायराईटचा उपयोग तांब्याच्या धातूला वितळवण्यासाठी करत असत. तांब्यापासून कुन्हाडीचे पाते, टोकदार हत्यारे, चाकू, बाण, भाल्याचे टोक बनवत असत.
४) कृषी जीवन - ताम्र व पाषाण यांच्या संयुक्तिक वापराने शेतीसाठी उपयुक्त अवजारांची निर्मिती केल्याचे दिसते. ताम्रपाषाण संस्कृतीतील हे लोक शेती करू लागल्याने त्यांच्या स्थायी स्वरूपाच्या वास्तव्यातून खेडी निर्माण झाली व यातूनच ग्रामीण महाराष्ट्राचा प्रारंभ झाला. या काळात गहू, तांदूळ, मसूर, मूग, उडीद, बाजरी इ. धान्ये पिकवली जात. तर गाय, बैल, म्हैस इ. प्राणी पाळले जात. उत्खननातून सापडलेल्या मासे पकडण्याच्या गळावरून मासेमारीचा व्यवसाय या काळात मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते.
५) समाजजीवन व धार्मिक संकल्पना - या काळातील मानव हा शाकाहार व मांसाहारांचा अन्नामध्ये समावेश करत. कंदमुळे व फळे याबरोबरच दुधाचाही आहारात समावेश करत. मनोरंजनासाठी सामूदायिक शिकार, प्राण्यांच्या झुंजी हे खेळ प्रचलित होते. उत्खननातून प्राप्त मातृदेवीच्या मूर्तीवरून हे मातृपूजा व प्राणी पूजा करत असावेत.
६) अलंकार - ताम्रपाषाण युगीन मानव शंख-शिंपल्यांच्या बांगड्या, तांबे धातूपासून बनवलेली आभूषणे, दगडी मणी व हस्तिदंताचीही सौंदर्य प्रसाधनांसाठी वापर करत असत. बांगड्या, अंगठ्या, कर्णफूले इ. अलंकारांचा हे लोक वापर करत असत.
७) दफन पद्धती- ताम्रपाषाण युगीन लोकांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास असल्याचे उत्खननात, मृत अवशेषांच्या पुराव्यांवरून दिसून येते. मृतदेह पुरण्यासाठी दफनकुंभ व शवपेटीचा वापर करत. मृताच्या दैनंदिन वापरातील वस्तू मृतासोबतच पुरल्याचे दिसून येते.
भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव - वसाहती
भारतात ज्या कालखंडातील हत्यारे व उपकरणांसाठी पाषाणाबरोबरच प्रथम तांब्याचा उपयोग होऊ लागला, या कालखंडाला ‘ताम्रपाषाणयुग’ असे म्हटले जाते. या कालखंडात तांबे वितळवण्याचे तंत्र भारतातील मानवाने चांगलेच आत्मसात केलेले होते.या कालखंडात तांब्याच्या कुऱ्हाडी, छिन्न्या आणि अनेक प्रकारचे छोटी शस्त्र तयार झालेले आहेत. याशिवाय तांब्याचे अनेक उपकरणे आणि अलंकारही उत्खननात सापडले आहेत. या कालखंडात तांब्याची व मातीची भांडी आढळतात. ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणजे तांबे आणि दगड या दोहोंची हत्यारे वापरणार्या लोकांची संस्कृती होय. नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृती काळातील लोकांना स्थलांतर करावे लागले. ते लोक जेथे नव्याने वसले, तेथे गाव-वसाहती या स्वरुपात नवीन संस्कृती उदयाला आल्या.या नवीन संस्कृतीचा प्रसार भारतात राजस्थान, गुजरात,बिहार,बंगाल,ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गंगेचे खोरे या प्रदेशात झाला.या संस्कृतीना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणतात.
उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोक जेथे जेथे पोहोचले तेथे स्थानिक संस्कृतीमध्ये ते मिसळून गेले. या ठिकाणी भांडी घडवणे, तांब्याच्या वस्तू बनवणे, शेती करणे या गोष्टींचे स्थानिक लोकांना ज्ञान दिले. त्यातून प्रादेशिकतेनुसार वैशिष्ट्यांचे वैविध्य दर्शविणाऱ्या वसाहतींच्या स्वरूपातील नवीन संस्कृती उदयाला आल्या. ग्राम-वसाहतीच्या रचनेत नागरी हडप्पा काळातील शिस्त दिसत नाही. हडप्पा येथील ‘एच’ या दफनस्थळातील मिळालेल्या अस्थीकुंभावरील नक्षीचे नमुने हे वेगळ्या प्रकारचे आहेत.त्यामध्ये चंद्र,सूर्य,मासे, हरीण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला दिसतो. अस्थीकुंभावरील मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे. उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक आर्य होते,असे काही पुरातत्वज्ञाचे मत आहे,पण हे लोक निश्चित कोण होते, हे ठरविण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.
राजस्थान --
‘आहाड’ किंवा ‘बनास’ संस्कृती- राजस्थानमधील मेवाड प्रदेशातील ही संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन संस्कृती आहे. तिचा कालखंड इ.स.पू. ४००० इतका प्राचीन आहे. उदयपूर जवळच्या आहाड येथे सर्वप्रथम तिचा शोध लागला, म्हणून तिला आहाड संस्कृती असे म्हणतात. आहाड संस्कृतीला ‘बनास संस्कृती’ असेही म्हणतात; कारण ही संस्कृती बनास नदीच्या उपनदीवर वसलेली आहे.
बालाथल आणि गिलुंड ही या संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते.त्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर गाव- वसाहतींना केला जात होता. आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहेत.ती चाकावर घडवलेली असत.त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असे. गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या संस्कृतीचा राजस्थानातील काळ इ.स.पू. 3000 वर्षे इतका प्राचीन आहे.
मातीच्या भांड्याबरोबरच मातीचे बैल, शंखांच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात मिळाल्या. बालाथल येथील घरे पक्क्या विटांची (इंग्लिश बॉण्ड पद्धत) बांधली होती. बालाथलभोवती तटबंदी होती. हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचा पुरावा आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते. तांबे वितळवून ते शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते. राजस्थानातील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत होते.
गणेश्वर-जोधपुरा संस्कृती-
गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक स्थळे राजस्थानातील खेत्री परिसरात सापडले आहेत. या गाव-वसाहती हडप्पापूर्व काळातील होत्या. गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याचे बाण आणि भाले यांचे अग्रे, मासेमारीचे गळ,बांगड्या, छिन्न्या यासारख्या वस्तू आणि आणि मातीची भांडी मिळाले. गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीचे लोक हडप्पा संस्कृतीच्या लोकांना तांब्याच्या वस्तू पुरवत असत.
गंगेचे खोरे-
गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी- गेरू रंगाच्या भांड्यांची खापरे नदीच्या पात्रात सापडतात. सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडतात. या संस्कृतीची स्थळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडतात. गंगा-यमुना या नद्यांच्या दुआबात इ.स.पू. 2000 च्या सुमारास नांदत होती.
या काळातील लोक स्थिर गाव-वसाहतीमध्ये राहत होते. त्यांची घरे, घरातील जमिनी चोपून तयार केलेल्या आहेत. त्या घरांच्या आतमध्ये चूली, मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरुपी बाहुल्या, बैल गाईगुरांची हाडे, तांदूळ ,सातू यासारख्या वस्तू सापडल्या. यावरून या संस्कृतीचे लोक स्थिर गाव- वसाहतींमधून राहत होते आणि ते शेती करत होते, हे स्पष्ट होते. भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, ओडिसा आणि मध्य प्रदेश येथे मिळाले आहेत. ताम्रनिधीमधील वस्तूंचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते, हे स्पष्ट आहे. गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात सापडतात. त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगाच्या भांड्याच्या संस्कृतीचे होते, असे मानले जाते.
ही संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोकांची आहे, असे काही पुरातत्वज्ञांचे मत होते. तर काही पुरातत्त्वज्ञ गंगा-यमुना नद्यांच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधींचा संबंध वैदिक आर्यांशी जोडतात. या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सान्निध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी, असाही एक मतप्रवाह आहे. बंगाल, बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये ताम्रनिधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी या प्रदेशांमध्ये मिळत नाहीत. या राज्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींची स्थळे उजेडात आली आहेत. बिहारमधील चिरांड, सोनपूर येथील उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळाली. या भांड्यांचे घाट (बनावट) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या घाटांसारखे आहेत. हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बंगाल, बिहार,ओडिसा या प्रदेशात स्थलांतर केले. ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी होय. शिवाय बंगाल आणि ओडिसातील ताम्रपाषाणयुगीन स्थळांमधील मातीच्या भांड्यांवर हडप्पा संस्कृतीचा प्रभाव आहे.
त्यामध्ये वाडगे, कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे.यावरून असे अनुमान काढले जाते की, हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते.
मध्य प्रदेश : कायथा संस्कृती -
मध्य प्रदेशातील कायथा जि.उज्जैन येथे या संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम सापडले, म्हणून तिला कायथा संस्कृती म्हणतात. कायथा संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. याचा शोध प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. वाकणकर यांनी लावला. कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते. हे लोक प्रामुख्याने हाताने बनवलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सुक्ष्मास्त्रे वापरत होते.
याशिवाय कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या, मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार सापडले. याशिवाय संगजिरा (steatite) या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी सापडले. यावरून कायथा आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्परसंबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा,असे दिसते. कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्यप्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्यप्रदेशात एकत्र नांदल्या असण्याचीही शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात.
गुजरात -
गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव-वसाहतींचा काळ हडप्पा संस्कृतीचे समकालीन आहे. त्यामध्ये -
कालखंड--
१. पूर्व हडप्पा इसवी सन पूर्व ३९५० -२६००
२. नागरी हडप्पा इ.स.पू.२६०० -१९००
३. हडप्पा संस्कृतीच्या नाशानंतर हडप्पोत्तर काळ.
या हडप्पा संस्कृतीच्या तिनही काळाशी मिळताजुळता आहे.
व्यवसाय -
गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या मातीच्या भांड्यांमध्ये कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते. गुजरातमध्ये गारगोटीच्या खड्यांपासून रंगी-बेरंगी मणी बनवणे, हा हडप्पा संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता. गाव वसाहतींमधून मण्यांसाठी कच्चा माल मिळवणे. मातीची नक्षीदार भांडी बनवणे. शेतीतून अन्नधान्य पिकवणे.नयासारखे व्यवसाय ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या काळात गुजरातमध्ये अस्तित्वात असावे, असे दिसते.
विस्तार -
गुजरातमधील या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात अशा विस्तीर्ण प्रदेशात झालेला होता.
इतर संस्कृतींशी आलेल्या संबंधाचा पुरावा - या संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील ‘प्रभाव संस्कृती’ आणि ईशान्य सौराष्ट्रातील ‘रंगपुर संस्कृती’ यांच्याशी होता. उत्तर हडप्पा काळात दक्षिण सौराष्ट्रात प्रभास जि. जुनागड येथे प्रभास संस्कृती, तर ईशान्य सौराष्ट्र रंगपूर जि. लिम्बडी येथे रंगपुर संस्कृती उदयाला आली. या दोन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे रंग, नक्षी, घाट याबाबतीत साम्य होते. या संस्कृती इसवी सनापूर्वी १८०० - १२०० या काळात अस्तित्वात होत्या.
ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र -
महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक तिथे पोहोचण्याआधीच्या काळात तिथे जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती, तिला सावळदा संस्कृती म्हणतात. त्यानंतरच्या काळात तेथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत.
सावळदा संस्कृती -
धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठी हे स्थळ आहे. सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापूर्वी सुमारे २००० -१८०० असा होता. या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा.
कारण धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू महाराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांची असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे. दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते. त्या भांड्यांवरील नक्षीमध्ये तीराग्रे ,माशांचे गळ, विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता. याशिवाय तांब्याच्या वस्तू, हाडांपासून बनवलेली तिराग्रे,खड्यांचे मणी ,दगडी पाटे-वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या. त्यांच्या गाव-वसाहतींभोवती तटबंदी बांधलेली होती. त्यांची घरे मातीची असून, घरातील जमिनी गाळ आणि माती एकत्र चोपून बनवलेल्या होत्या.
माळवा आणि जोर्वे संस्कृती : महाराष्ट्राचे आद्य शेतकरी -
महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव-वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. इसवी सनापूर्वी १६०० च्या माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले. माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसविल्या. हे शेतकरी शेतीत गहू, बार्ली, ज्वारी अशी पिके घेऊ लागले. त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते. महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी आला. त्यामुळे सावळदा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचे तंत्रज्ञान, घाट नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले आणि जोर्वे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती उदयास आली.संपूर्ण राज्यभर या शेतकरी संस्कृतीचे अस्तित्व आढळून आले. ही सारी स्वयंपूर्ण खेडी होती.
अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे येथे हे संस्कृती प्रथम उजेडात आली. म्हणून तिला जोर्वे संस्कृती असे म्हणतात. महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार तापी, गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्यात झाला होता. इनामगाव,ता.शिरूर, जि. पुणे. येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोर्वे संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध झालेली आहे. सिंधू संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीमधला फरक म्हणजे ही संस्कृती पूर्णपणे ग्रामीण होती.
१. माळवा संस्कृती--- इ.स.पू.१६०० -१४००
२. पूर्व जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१४०० -१०००
३. उत्तर जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१००० -७००
उत्खनित स्थळे-
दायमाबाद,प्रकाशे, जिल्हा नंदुरबार, चांडोली, सोनगाव, इनामगाव, वाळकी जिल्हा पुणे, नेवासे जिल्हा अहमदनगर, पिंपळदर जिल्हा नासिक,
माळवा संस्कृती ( इ.स.पू.१६००-१४०० )
या काळातील लोकांची घरे--लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस होती. घराच्या भिंती कुडाच्या असत. घरामध्ये आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत. जमिनीतून गोल खड्डा करून झोपड्या( गर्तावास ) उभारल्या जात.
धान्य साठवण व्यवस्था--
कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा,चार पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड आणि चून्याने लिंपलेले बळद यासारख्या गोष्टीवरून घरामध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते.
मातीची भांडी-
मातीची भांडी पिवळसर रंगाची असत. त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असे. त्यांचा पोत खरबरीत असतो.
पूर्व जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१४००-१०००)
या काळातील लोकांची घरे- घरे चौकोणी, प्रशस्त, एकापेक्षा अधिक खोल्यांचे होते. गोल खड्डा करून त्यावर उघडलेल्या झोपड्यांची (गर्तावास) संख्या नगण्य होती. गाव प्रमुखाचे मध्यवर्ती जागेत पाच खोल्यांचे घर होते.
मातीची भांडी-- त्या काळातील भांडी खणखणीत भाजलेली असल्यामुळे त्यांचा नाद धातूच्या भांड्याप्रमाणे असतो. त्यांचा रंग लाल असतो आणि काळ्या रंगाने नक्षी काढलेली असते. मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे आणि कुंडे, चंबु, घडे अशा घाटाच्या भांडयांचा समावेश होता. या काळातील कुंभकाराच्या भट्ट्या गोल आकाराच्या होत्या. त्यांची क्षमता जास्त होते. इनामगाव हे इतर गावांना मातीची भांडी पुरवणारे केंद्र होते. पूर्व जोर्वे काळात इनामगावमध्ये नदीला कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती.
सिंचनासाठी वापर होत असे. गाव प्रमुखाकडे पाणीवाटपाचे अधिकार होते. गाव प्रमुख पद वंशपरंपरागत होते. हे दर्शवणारी दफणे प्रमुखाच्या घरालगत सर्वसाधारण दफना पेक्षा वेगळ्या पद्धतीची होती.
धान्य साठवण व्यवस्था-घराच्या बाहेर बरीच बळदे होती.येथील शेतकरी गहू,बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ यासारखी पिके घेत होते.
दफनपद्धती- प्रमुखाची दफने घरालगतच वेगळ्या पद्धतीची होती.
साधारणत: जमिनीत खड्डा खणून मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेत पुरले जाई. तर कधी मृत व्यक्तीला एका चार पायाच्या, फुगिर पोटाच्या रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरले जाई. दोन पद्धतीने दफन केले जाई. मृत बालकाला पुरण्यासाठी कुंभाचा वापर करत असत.
उत्तर जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१००० -७०० )-
या काळातील लोकांची घरे- या काळात हवा शुष्क होऊ लागली, त्यामुळे लोकांना फिरस्ते जीवन जगावे लागले. परिणामी घराऐवजी झोपड्यांची संख्या वाढली. त्या गर्तावासाहून वेगळ्या होत्या.टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरून तंबूप्रमाणे शंक्वाकृती झोपड्या होत्या. मातीची भांडी- पूर्व जोर्वे संस्कृती काळासारखे भांड्यांचे घाट असले तरी त्यावर फारसे नक्षीकाम नव्हते. कुंभाराचे आवे( भट्ट्या) जमिनीवरच रचले जात.
महाराष्ट्रातील महापाषाण युग -
आदिमानव हा नदीजवळ वस्ती करत असेल .भटक्या अवस्थेत असल्याकारणाने दगडाची हत्यारे करीत असे. जुने झालेले हत्यार तो तेथेच टाकून स्थलांतर करी .नदीच्या गाळामुळे ती हत्यारे बुजवली गेली आणि कालपरत्वे नदीपात्र शुष्क झाल्यावर प्राचीन हत्यारे आणि वसाहती दिसू लागल्या .बहुतांश संस्कृतींचा शोध हा नदिकिनारी लागला. ज्याप्रमाणे धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नद्या या महाराष्ट्राचे पोषण करतात. ऋग्वेदामध्ये सिंधू ,सरस्वती ,गंगा या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केले ले आपल्याला आढळते .या न्यायाने भीमा ,वरदा ,कृष्णा, कोयना ,प्रवरा ,गोदावरी, तापी या महाराष्ट्रातील सप्त गंगाच !!आणि जोर्वे संस्कृती नांदली यांच्याच खुशीत.
संस्कृतीविषयी इंग्लिशमधून बोलताना दोन वेगवेगळे शब्द वापरले जातात – कल्चर आणि सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन हा सिव्हिल म्हणजे नागर होण्याच्या दिशेने झालेला प्रवास, प्रक्रिया आहे तर कल्चर हा त्या प्रक्रियेचा आविष्कार आहे. मराठीमध्ये सरसकट संस्कृती हा एकच शब्द वापरला जातो. पण ‘सिंधु संस्कृती’ आणि ‘मराठी संस्कृती’मधल्या ‘संस्कृती’ या शब्दांच्या अर्थामधला फरक संदर्भाने माहीत असतो. नागरीकरण याचाच अर्थ रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत होण्याची प्रकिया. जीवनाच्या विविध अंगांवर होणारे संस्कार. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि त्याबरोबर तंत्रज्ञानामध्ये होणारे बदलही.
अश्मयुगीन मानव गुहेत राहायचा. शिकार करणे आणि कंदमूळ खाणे अस त्याच जीवन असायचं. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नपाण्याच्या शोधात भटकंती चालू असायची. कुऱ्हाडीसारख्या हत्याराचा वापर व्हायचा. काही काळाने त्याला जमिनीत पेरल की उगवत याचा शोध लागला. हा शोध क्रांतिकारी होता. त्यातूनच शेतीची कल्पना पुढे आली.अस म्हणतात की, मानवाला शेतीचा शोध लागला आणि त्याच भटक आयुष्य स्थिर झाल. नदीच्या आसपास एकेठिकाणी वस्ती करून राहणे भाग पडले. जगभरात अशा नदीच्या शेजारच्या संस्कृती सापडल्या. यात सर्वात महत्वाची मानली जाते ती सिंधू संस्कृती. हडप्पा मोहोन्जोदारो मध्ये आढळून आलेले अवशेष दाखवून देत होते की सिंधू संस्कृती एक प्रगती संस्कृती होती. ते शेती करायचे, गायी, बैले असे प्राणी पाळायचे, घाटाची भांडी स्वैपाकाला वापरायचे. इतकच काय त्यांनी शहरे वसवली होती. त्याच्या अभ्यासातून बरीच माहिती समोर येत होती. मात्र फाळणीनंतर हे सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात राहिले.भारतात इतरत्र या संस्कृतीची अवशेष शोधून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले.
सिंधू संस्कृतीच्या उदयाने अत्यंत प्रगत अशी नागरी संस्कृती प्रकट झाली. सिंधू खोऱ्यात उगम होऊन की गंगा-यमुनेच्या सुपीक पट्ट्यात स्थिरावली .पण काही कारणाने याठिकाणी दुष्काळ जाणवला पाश्चात्य बाजूकडील व्यापार आणि दळणवळण बंद पडले. त्यामुळे हे लोक उदरनिर्वाहासाठी दक्षिणेकडे निघाले. उत्तरेतील पर्यावरण प्रतिकूल होऊ लागल्या मुळे या काळात तिथल्या लोकांनी स्थलांतरे सुरु केली. सरस्वती नदी आटू लागली होती. पावसाचे प्रमाण कमी झाले होते. शेती करणे अशक्य होऊ लागले. हेच शेती करणारे लोक गुजरात महाराष्ट्र येथे नद्या काठी येऊन वसले.राजस्थान आणि सौराष्ट्र यामार्गे ते दक्षिणेकडे निघाले .या भागात प्रगत पद्धतीची शेती करू लागले आणि शेती करीत असतानाच तापी खो-यातून ते दायमाबाद म्हणजेच महाराष्ट्रात आले. तापी खोऱ्यातील नंदुरबार जवळील प्रकाश येथे त्यांची एक वस्ती सापडते .हे लोक येताना त्यांची दैवते घेऊन आले. त्याच बरोबर सातू ,गहू, ज्वारी ,बाजरी ही धान्ये ही घेऊन आले. मूलतः ज्वारी बाजरी ही धान्य भारतीय नसून पर्शिया जवळील आहेत .पण सिंधू सभ्यतेच्या लोकांच्या पाश्चात्त्य देशांशी असलेल्या संबंधांमुळे ती महाराष्ट्रात आली. दायमाबाद हे ठिकाण तीन ते चार संस्कृतींचे माहेरघर बनले .यामध्ये सिंधू ,माळवा ,सावळग इत्यादी संस्कृतींचे अवशेष सापडले इसवी सन पूर्व सतराशे ते पंधराशे दरम्यान माळवा संस्कृती ही प्रगत झाली .आणि तिचा उल्लेख जोर्वे संस्कृती असा झाला...
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर या नागरीकरणाच्या प्रवासाच्या दिशेने सुरुवात सुमारे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी झाली. इथल्या अतिप्राचीन मानवी वसाहतीचे तीन कालखंड पडतात. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग आणि लोहयुग. इथल्या माणसांनी, त्यांना मराठी म्हणता येणार नाही कारण मराठी ही आपली ओळख जेमतेम बाराशे-तेराशे वर्षे जुनी आहे. आद्य अश्मयुगात म्हणजे साधारण दोन लाख वर्षांपूर्वी तयार केलेल्या दगडी हत्यारांचे अवशेष गोदावरी, प्रवरा, मुळा-मुठा, तापी, पूर्णा, वर्धा इत्यादी अनेक नद्यांच्या काठी सापडले आहेत.
दुसऱ्या सहस्राब्दीच्या मध्यापासून ते इ.स. १००० पर्यंत चाल्कोलिथिक काळात , जोर्वे संस्कृती ही सध्याच्या महाराष्ट्रात केंद्रित असलेली एक सांस्कृतिक मालिका आहे. ही संस्कृती माळवा संस्कृतीशी जोडलेली होती आणि त्यानंतर आली आणि असे मानले जाते की माळवा संस्कृती समुदायांच्या दख्खन प्रदेशात स्थलांतरातून ती उद्भवली आहे, जिथे ते विद्यमान नवपाषाण कृषी समुदायांच्या संपर्कात आले, ज्यामुळे सांस्कृतिक संश्लेषण झाले. या संस्कृतीचे पुरावे प्रथम १९५०-५१ मध्ये महाराष्ट्रातील जोर्वे येथे उत्खनना दरम्यान सापडले, ज्यावरून या संस्कृतीचे नाव पडले आहे. मध्य महाराष्ट्रातील प्रवरा-गोदावरी खोरे हे जोर्वे संस्कृतीचे केंद्र मानले जाते. ही संस्कृती सध्याच्या महाराष्ट्राच्या बहुतेक भागात पसरली होती, किनारी कोकण प्रदेश वगळता, पूर्वेला विदर्भातील पूर्णा खोऱ्यापासून पश्चिमेला पुण्याजवळील थेऊरपर्यंत आणि उत्तरेला खानदेश प्रदेशापासून दक्षिणेला वरच्या कृष्णा खोऱ्यापर्यंत पसरलेली होती. संस्कृतीची सर्वात प्रमुख ठिकाणे म्हणजे दायमाबाद, नेवासा, बहल, प्रकाशा, चांडोली, सोनगाव, थेऊर आणि इनामगाव, ज्यामध्ये प्रकाशा, दायमाबाद आणि इनामगाव हे वस्ती क्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठे होते. प्रमुख ठिकाणे नदीच्या खोऱ्यात होती, ज्यात तापी खोऱ्याजवळ प्रकाश, गोदावरी खोऱ्यात दैमाबाद आणि भीमा खोऱ्यात इनामगाव होते.
आपण इतिहासात शिकलो की भारताच्या वायव्येकडे सिंधू ही नागर संस्कृती सापडली .तशी एखादी संस्कृती महाराष्ट्रात सापडलीच नाही का? तर ती सापडली आणि तिचे नाव जोर्वे संस्कृती . महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात भर टाकायचे काम, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगाची जगाला ओळख करून द्यायचे काम हे संगमनेर तालुक्यातील जोर्वे खेड्यापासून झाले. पुरातत्त्व खात्याच्या प्रघाताप्रमाणे ज्या ठिकाणी अवशेष सापडले त्या संस्कृतीला त्या गावाचे नाव देण्यात येते. उदाहरणार्थ =हडप्पा संस्कृती .तसेच या संस्कृतीचे अवशेष प्रथमतः जोर्वे येथे सापडले म्हणून या संस्कृतीला जोर्वे संस्कृती असे म्हणतात. जोर्वे संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील आहे. या युगात लोखंडाचा शोध लागलेला नव्हता फक्त दगड आणि तांब्याच्या आधारे अवजारे बनवली जात .जोर्वे चा शोध लागल्यानंतर अनेक ठिकाणी उत्खननात समकालीन गोष्टी सापडल्या .दायमाबाद, इनामगाव, नेवासा, चिंचोली ,प्रकाश(नंदूरबार) याठिकाणी उत्खननात साम्य दर्शक गोष्टी सापडल्यात .ताम्रपाषाण युग हे इसवी सन पूर्व बाराशेलाच संपले ,पण जोर्वे संस्कृतीत ते इसवी सन पूर्व सातशे पर्यंत सापडते.
१९४८ पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास हा सातवाहन पर्यंतच मर्यादित होता. पण १९४७ ला प्रवरा नदीला मोठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेती देखील पाण्याखाली गेली .या प्रकोपाला तोंड देण्यासाठी गावाने नदीच्या काठापासून आत चढावर वस्ती हलविली आणि शेती नदीकडे हलविली .आणि एक दिवस अचानक भाजक्या मातीची पात्रे ,मडकी त्यावर नक्षीकाम आणि कुऱ्हाडीची पाती असा खजिना सापडला ..प्रत्येक गावाला मौखिक गोष्ट असते .त्याचप्रमाणे जोर्वे लाही आहे. म्हणतात ही महाभारतातील जरासंधाची नगरी होती. याला जेऊर ग्राम असे नाव होते .नंतर अपभ्रंशित होऊन ते जोर्वे झाले .लोकांना वाटले की हे पुराण काळातील भांडी असावीत .आणि लागोलाग बातमी पसरली आणि डॉ. एच .डी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खननास प्रारंभ झाला..
ताम्रपाषाण युगात शेतीची माहिती असलेल्या, तांब्याची आणि दगडी हत्यारे वापरणाऱ्या टोळ्या इथे स्थायिक झाल्या होत्या. ती माणसे गवताने शाकारलेल्या कुडाच्या झोपडीत राहात होती. शिकार, शेती, पशुपालन, मासेमारी ही त्यांच्या उपजिविकेची साधने. हे आद्य शेतकरी. गहू, तांदुळ, ज्वारी, डाळ अशी धान्ये पिकवत असत. जनावरांचे मांस खारवून वाळवून ठेवत असत आणि अंगणात एक खड्डा करून त्यात मांस भाजत असत. धान्य कुटले जात असे आणि त्यासाठी दगडी खल वापरत असत. धान्य दळण्याचे जाते आपल्याकडे इजिप्तमधून उशीरा आले. या इजिप्शीयन जात्याची वरची तळी उभट असून जड असते. दोन्ही तळी सारख्या असणारे जाते हे इजिप्शीयन जात्याचे विकसित रूप आहे.
आजवर सुमारे २५ उत्तर सिंधू संस्कृतीच्या वसाहतींची नोंदणी तापीच्या खोर्यात झाली असली तरी त्यांच्या जीवनशैलीबद्दल विस्ताराने जाणून घेता आलं ते प्रवरेच्या खोर्यातील दायमाबादच्या उत्खननामुळे. दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या या सर्वात मोठ्या वसाहतीत असं दिसून आलं की नागरीकरण लयाला गेलं असलं, तरी इतक्या शतकांनंतरही घरबांधणीच्या भूमितीत बदल झाला नव्हता. आता भाजक्या मातीच्या विटा नव्हत्या, तर कच्ची भेंडं वापरून घरं बनवली जात होती. पण विटांचा आकार मात्र अजूनही ४:२:१ अशाच मापात होता. भिंती अजूनही अचूक काटकोनात उभारल्या जात होत्या. आणि मृतांची दफनंही आधीच्या पद्धतीने खड्डा खणून केली जात होती. पूर्वीच्या सुंदर नक्षी असलेल्या मातीच्या मडक्यांऐवजी आता फार उत्तमरीतीने भाजलेली, सिंधूसंकृतीच्या नागरी कालखंडातल्या मडक्यांशी साधर्म्य सांगणारी काळ्या रंगाची भौमितिक नक्षी काढलेली लाल रंगाची मडकी वापरली जाऊ लागली. अर्थात उपजीविकेच्या पद्धतीत मात्र फरक पडला नाही. आधीप्रमाणेच पशुपालन, शेती आणि शिकार यावर त्यांचं जीवन अवलंबून होतं. यांचेही गुजरात-राजस्थान-माळवा येथील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींशी देवाणघेवाणीचे संबंध होते.
तसंच या उत्खननात सिंधूसंस्कृतीची लिपी कोरलेल्या दोन वर्तुळाकार मातीच्या मुद्रा आणि चार खापराचे तुकडे मिळाले. ही लिपी अजूनही वाचता न आल्याने त्यावर काय लिहिलंय ते जरी अज्ञात असलं तरी हा नागरी संस्कृतीचा वारसा इतक्या शतकांनंतर इतक्या दूरवरच्या प्रदेशात जपला गेल्याचं महत्व कमी होत नाही.
यात सगळ्यात सनसनाटी, लक्ष वेधून घेणारा शोध ठरला तो म्हणजे या पांढरीच्या टेकाडावर एका शेतकर्याला मिळालेल्या चार ब्रॉन्झच्या मूर्ती. दोन बैलांचा रथ हाकणारा माणूस, गेंडा, म्हैस आणि हत्ती. विशेष म्हणजे या सगळ्यांना खाली चाकं आहेत. अभ्यासकांच्या मते ही खेळणी नसून यांचा संबंध धार्मिक श्रद्धा समजुतींशी असणार व कदाचित मिरवणुकीसारख्या कुठल्या विधीत यांचा वापर होत असण्याची शक्यता असावी. जरी या मूर्तींच्या कालनिर्णयाविषयी वाद आहेत, तरीही बहुसंख्य अभ्यासकांच्या मते या उत्तर सिंधू संस्कृतीशी संबंधितच आहेत.
गुजरातेतून आलेले हे सांस्कृतिक प्रभाव इथल्या लोकसमूहाच्या जीवनशैलीत मिसळून गेले. जरी नंतरच्या ताम्रपाषाणयुगीन कालखंडात ही घरबांधणी, लिपी लोप पावलेली दिसते तरी त्यांचे कर्ते इथल्या लोकसमूहात एकरूप होऊन गेले असणार.
मराठी असणं, दख्खनी असणं म्हणजे काय यावर भरपूर उहापोह करता येईल. पण एखादी प्रादेशिक अस्मिता जेव्हा निर्माण होते तेव्हा ती कितीही स्वतंत्र असली तरी तिच्या आसपासच्या संस्कृतींपेक्षा, प्रादेशिकतेपेक्षा वेगळी, अलिप्त राहू शकत नाही याचं भान आपल्याला राखलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत गेल्या चार-साडेचार हजार वर्षांत अनेक लोकसमूह, त्यांचे सांस्कृतिक प्रभाव आले, इथल्या मातीत मिसळले, रुजले आणि संस्कृतीची नदी वाहती राहिली. आज त्या सगळ्यांची स्मृती राहिलीच आहे असं नाही, त्यांचे वेगवेगळे रंग सांगता येणार नाहीत असे मिसळून गेलेत. पण यात सुदूर वायव्य भारतातल्या नागरी सिंधू संस्कृतीचाही एक प्रवाह कधी काळी येऊन मिळालाय, कुठेतरी एकाच धाग्याने हे पश्चिम आणि वायव्य भारतातले प्रदेश जोडले गेले होते इतकं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं तरी खूप आहे!
जोर्वे संस्कृती :- महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात. अशीच एक - थोडीशी नंतरच्या काळातील - वसाहत सापडली जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे. सुमारे २५ ते ३०,००० वर्षांपूर्वीच्या या हत्यारांबरोबरच रेघांनी सुशोभित केलेलं शहामृगाच्या अंड्याचं एक टरफलही सापडलं..
ही अशी लाखो वर्षं भटक्या अवस्थेत काढल्यानंतर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्याचा भाग ( ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत.
आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. तिथेही ही वाटचाल अश्मयुगाकडून शेतीकडे अशी सलग झाली. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख नर्मदेच्या दक्षिणेला रहाणार्या मानवसमूहाला झाली असं दिसतं. या सर्व प्रसारामधे मात्र एका लोकसमूहाने विविध ठिकाणी पांगून जाऊन, नव्या वसाहती करून शेतीची ओळख त्या त्या प्रदेशाला करून दिली असं काही दिसत नाही. त्या त्या प्रदेशातील स्थानिक लोकांनी शेजारच्या शेती करणार्या समाजांकडून हे नवं तंत्र आत्मसात करून घेतलं. असो. परत येऊया महाराष्ट्रातील आदिम वसाहतींकडे.. आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे. या वसाहतींचा आढावा घेताना आपण एकत्रच या सगळ्या कालावधीचा विचार करणार आहोत. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा. धुळे जिल्ह्यातली कवठे इथली वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स. पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/ साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.
कवठे येथील घर
अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले. आजवर अशी १५० हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्यापैकी मोठी होती. दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३० हेक्टर मोठं होतं आणि त्याला तटबंदी होती तर इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३ हे. च्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या. गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. जोर्वे संस्कृतीची घरे मालवा संस्कृतीच्या घरांचे अनुकरण करत होती, ज्यामध्ये आयताकृती आराखडे, भिंती आणि शंकूच्या आकाराचे बांधकाम होते. घरांमधील अंतर गल्ल्यांचे सीमांकन करण्यात काही प्रमाणात नियोजन असल्याचे सूचित करते. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
दुसऱ्या सहस्राब्दीच्या मध्यापासून ते इ.स. १००० पर्यंत चाल्कोलिथिक काळात , जोर्वे संस्कृती ही सध्याच्या महाराष्ट्रात केंद्रित असलेली एक सांस्कृतिक मालिका आहे. ही संस्कृती माळवा संस्कृतीशी जोडलेली होती आणि त्यानंतर आली आणि असे मानले जाते की माळवा संस्कृती समुदायांच्या दख्खन प्रदेशात स्थलांतरातून ती उद्भवली आहे, जिथे ते विद्यमान नवपाषाण कृषी समुदायांच्या संपर्कात आले, ज्यामुळे सांस्कृतिक संश्लेषण झाले. या संस्कृतीचे पुरावे प्रथम १९५०-५१ मध्ये महाराष्ट्रातील जोर्वे येथे उत्खननादरम्यान सापडले, ज्यावरून या संस्कृतीचे नाव पडले आहे.
१९४०-४५ पर्यंत महाराष्ट्रात अगदीच तुरळक उत्खनने झाली. उदा: निझाम सरकारच्या पुरातत्त्व खात्याने केलेले पैठण येथील व भारत इतिहास मंडळाने केलेले कराड येथील उत्खनन.. पण त्यात मिळालेले पुरावे अगदीच मर्यादित होते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या रूपरेखेत फारसा बदल झाला नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र पुरातत्त्वशास्त्रीय संशोधनाला महाराष्ट्रात चांगलाच वेग आला आणि या प्रदेशात मनुष्यवस्ती कधीपासून झाली आणि त्यात कसे आणि कोणते बदल होत गेले याचे एक बर्यापैकी सुसंगत चित्र आपल्यासमोर उभे राहिले. अजूनही नित्य नूतन संशोधन होतच आहे. आज आपण इथे जी माहिती वाचणार आहोत ती बहुतांशी या पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक साधने आणि संशोधनावर आधारित आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पुरातत्त्वशास्त्रज्ञ भूभागाचे सर्वेक्षण करून जुन्या मानवी वस्तींची ठिकाणे शोधून काढतात आणि त्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उत्खनन करून त्या वसाहतींच्या अवशेषांचा अभ्यास करतात. सर्वसामान्यपणे उत्खननात मिळणारे अवशेष म्हणजे घरांच्या जमिनी/ plans, खापरांचे तुकडे, हाडे, दगडाची व धातूची औजारे व हत्यारे, दफने, धान्याचे जळालेले दाणे, मणी, राख, माती, इ,. या सगळ्याचे परीक्षण करून विविध निष्कर्ष काढले जातात व शक्य असेल तिथे कालमापन पध्द्ती वापरून या अवशेषांचे वयोमान ठरवतात. इतिहासपूर्व काळात, लिखित स्वरूपाचे कुठलेही पुरावे नसताना, फक्त याच पुराव्यांचे दुवे जुळवत आपल्याला पुढे जायला लागते. एकदा ऐतिहासिक कालखंडात आलं की या सगळ्या गोष्टींबरोबरच शिलालेख, ताम्रपट, नाणी, ग्रांथिक पुरावे, वास्तुकला, ही साधनेही मदतीला येतात. आणि या सगळ्याचा साकल्याने अभ्यास करून आपल्याला इतिहास लिहिता येतो. १९४७ पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास फक्त दोन हजार वर्षे मागे नेता येत होता. सातवाहन राजांचे शिलालेख, नाणी, तत्कालीन लेणी इ. पुराव्यावरून हे महाराष्ट्रातलं पहिलं राजकुल असावं असा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. पण त्याआधी इथे कुणाची वसाहत होती? किती आधीपासून होती? या प्रश्नांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. मग त्या स्पष्टीकरणासाठी पुराणांतरी उल्लेख आलेल्या शक, नाग, हूण अशा वेगवेगळ्या कुलांच्या स्थलांतरांमधे धांडोळा घेतला जात होता हे सगळं चित्र अचानक बदललं. कसं? त्याचीही कहाणी तितकीच रंजक आहे.. भारतातल्या इतर लाखो खेडेगावांसारखंच एक जोर्वे होतं. संगमनेरच्या पूर्वेला ६ मैलांवर, प्रवरेच्या काठी वसलेलं एक सर्वसाधारण खेडं. आपल्याकडे तशी अधूनमधून अस्मानी संकटं येत असतात, त्याचाच एक प्रकार म्हणून १९४७ साली प्रवरेला मोठ्ठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेतंसुद्धा पाण्याखाली गेली. परत अशा प्रकोपाला तोंड देणं सोयीचं व्हावं म्हणून गावाने नदीच्या काठापासून थोडी आत, चढावर वस्ती हलवली आणि आसपासची जमीन शेतीखाली आणायचं ठरवलं. आणि काय आश्चर्य! शेतीत नांगरताना अफुट, अखंड, मातीची भांडी सापडायला लागली. नेहेमीसारखी करडी, काळी, लालसर माठाची मडकी नव्हेत तर अगदी उत्तम भाजणीची, लाल रंगाची, वरती काळ्या रंगाने सुंदर नक्षीकाम केलेली तोटीची भांडी! आणि तांब्याची कुर्हाडीची पाती. कुठल्याही गावाला जशी स्थानिक परंपरा, मौखिक गोष्टींतून चालत आलेला इतिहास असतो, तसा जोर्वेला सुद्धा होता. म्हणे कोणे एके काळी ही खुद्द जरासंधाची नगरी होती. त्यामुळे ही मडकी नक्कीच अशी पुराणकाळातली असली पाहिजेत असं आसपासच्या लोकांना वाटलं असणार! ही सगळी बातमी कानोकानी होत होत पोचली ती संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेन्ट बोर्डमधे काम करणार्या शंकर साळी नामक तरुणाकडे. त्याने उत्साहाने या गावाला भेट देऊन ती खापरं पाहिली आणि त्यासंबंधी एक छोटीशी बातमी दैनिक भारत या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणली. आणि ही सगळी माहिती आणि खापरं घेऊन गाठलं या क्षेत्रातल्या एका जाणकाराला! डॉ. ह धी. सांकलिया यांना. त्यावेळी पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत नुकताच पुरातत्त्वशास्त्राचा विभाग सुरू झाला होता. डॉ. ह. धी. सांकालिया या तरुण पुरातत्त्वशास्त्रज्ञाची तिथे नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत संस्कृत शिकून, इंडॉलॉजीचा अभ्यास करून, नंतर इंग्लंडमधे खुद्द मॉर्टिमर व्हीलर नामक प्रख्यात पुरातत्त्वज्ञाच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. इथे विद्यापीठ पातळीवर सरकारी चौकटीच्याबाहेर नव्याने पूर्ण विभागाची/ज्ञानशाखेची उभारणी करण्याचं काम मोठ्या तडफेने त्यांनी सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून नाशिक या पुरातनकालापासून अस्तित्वात असलेल्या नगरीचे उत्खनन करायचं ठरलं होतं. श्री. साळींनी आणलेली खापरं त्यांनी पाहिली आणि जोर्वेलाही छोटंसं उत्खनन करायचं असं ठरवलं. १९५० साली उत्खनन केल्यावर ही खापरं एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं; पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने आणि तोपर्यंत शास्त्रीय कालमापन पद्धती अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं हा प्रश्नच होता! नाशिकच्या उत्खननाने मात्र हा प्रश्न समूळ सोडवला. तिथे सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या थरांमधे अशीच रंगीत, नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले. आत्तापर्यंत हे ही स्पष्ट झालं की या समाजाला लोखंड बनवायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. माहित होतं फक्त तांबं आणि दगड - म्हणून यांना ताम्रपाषाणयुगीन वसाहती म्हणतात. अशा तर्हेने महाराष्ट्रातील वसाहतींचा इतिहास एकदम २००० वर्षे मागे गेला आणि इतिहासपूर्वकालीन महाराष्ट्राच्या संशोधनाला जबरदस्त चालना मिळाली! एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. यात तापी खोर्यातील प्रकाश, सावळदा, बहाळ, टेकवडे, कवठे, गोदावरी-प्रवरा खोर्यातील दायमाबाद, नेवासा, आपेगाव तसेच भीमा खोर्यातील शिरूरजवळ इनामगाव, बारामतीजवळचं सोनगाव, थेऊर इत्यादी स्थळांचा प्रामुख्याने समावेश होतो. या उत्खननांमुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालीन आदिम वसाहतींचा चेहरामोहरा कसा होता हे सांगता येतं. मध्य महाराष्ट्रातील प्रवरा-गोदावरी खोरे हे जोर्वे संस्कृतीचे केंद्र मानले जाते. ही संस्कृती सध्याच्या महाराष्ट्राच्या बहुतेक भागात पसरली होती, किनारी कोकण प्रदेश वगळता, पूर्वेला विदर्भातील पूर्णा खोऱ्यापासून पश्चिमेला पुण्याजवळील थेऊरपर्यंत आणि उत्तरेला खानदेश प्रदेशापासून दक्षिणेला वरच्या कृष्णा खोऱ्यापर्यंत पसरलेली होती. संस्कृतीची सर्वात प्रमुख ठिकाणे म्हणजे दायमाबाद, नेवासा, बहल, प्रकाश, चांडोली, सोनगाव, थेऊर आणि इनामगाव, ज्यामध्ये प्रकाश, दायमाबाद आणि इनामगाव हे वस्ती क्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठे होते. प्रमुख ठिकाणे नदीच्या खोऱ्यात होती, ज्यात तापी खोऱ्याजवळ प्रकाशा, गोदावरी खोऱ्यात दायमाबाद आणि भीमा खोऱ्यात इनामगाव होते.
गेल्या पंचवीस वर्षांतील समन्वेषण व उत्खनने यांनुसार या जोर्वे संस्कृतीची व्याप्ती महाराष्ट्रातील तापी, गोदावरी, प्रवरा, घोड, भीमा, कृष्णा गिरणा, मुळा इ. नद्यांच्या खोऱ्यात, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश व कर्नाटक या राज्यांत दिसून येते. जोर्वे, नेवासे, इनामगाव येथील उत्खननांत या संस्कृतीचे व्यापक दर्शन झाले आहे. चाकावर घडविलेली, खणखणीत आवाजाची व प्रामुख्याने भौमितिक नक्षीकाम असलेली मृत्पात्रे, कुडाची काटकोन चौकोनी व गोल आकाराची घरे, गहू व बार्ली या धान्यांची लागवड, धान्य साठवणीस बांधलेल्या वेताच्या व मातीच्या कणग्या, मुलांचे दोन दफनकुंभातील व प्रौढांचे आडव्या रांजणातील दफन, तांब्याची तसेच दगडाची घोटीव व गारगोट्यांच्या छिलक्यांची हत्यारे, शेतीकरिता बंधारा-धरणाची बांधणी व नदीतून नावांच्या साहाय्याने वाहतूक इ. जोर्वे संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये ठरलेली आहेत. या संस्कृतीच्या चांदोली, सोनगाव, इनामगाव या ठिकाणांच्या उत्खननांत उपलब्ध झालेल्या कार्बन १४ कालमापनानुसार या संस्कृतीचा काळ इ. स. पू. सु. चौदावे शतक ते इ. स. पू. नववे शतक असा निश्चित करता आलेला आहे.
वैशिष्ट्ये :-
ही संस्कृती त्याच्या विशिष्ट मातीकामासाठी ओळखली जाते, जी पूर्वीच्या मालवा संस्कृतीपेक्षा अधिक परिष्कृत दर्जाची होती. येथील भांडे म्हणजेच कुंभ ,वाडगे ,थाळ्या या भाजक्या मातीच्या बनवलेल्या असत.जोर्वे संस्कृतीची मातीकाम दोन प्रकारची होती - वैशिष्ट्यपूर्ण काळी-लाल मातीकाम आणि खरखरीत लाल किंवा राखाडी भांडी. जास्त भाजल्यामुळे तांबडा रंग यांना येत असत. भांड्यावर फुले ,पाने आणि मासेमारी करतानाचे दृश्य सापडले आहेत पहिली मातीकाम जलद चाकावर फिरवलेल्या आणि चांगल्या प्रकारे बेक केलेल्या बारीक कापडाची होती. या मातीकामाच्या लाल/नारिंगी पृष्ठभागावर काळ्या रंगद्रव्यात भौमितिक नमुन्यांचा रंग होता. या शैलीमध्ये बनवलेल्या वस्तूंमध्ये कॅरिनेशनसह अवतल बाजू असलेला वाडगा, भडकणारे तोंड असलेल्या नळीच्या आकाराचा लोटा आणि उंच मानेचे भांडे यांचा समावेश होता. लाल किंवा राखाडी भांडी खरखरीत कापडाने बनवली जात असे आणि साठवणुकीच्या भांड्या, वाट्या, बेसिन आणि वातीसाठी कोनाड्या असलेले दिवे यासारख्या दैनंदिन वस्तूंसाठी वापरली जात असे. लाल किंवा राखाडी भांड्यांना कधीकधी काठावर लाल गेरूने प्रक्रिया केली जात असे, तर खरखरीत भांड्यांवर छेदन आणि अॅप्लिक नमुने होते. विद्वानांचे असे मत आहे की दोन्ही प्रकारच्या मातीकामांवर अनुक्रमे मालवा आणि दक्षिणेकडील नवपाषाण संस्कृतींचा वेगळा प्रभाव दिसून येतो. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजेच तोटी असलेल्या भांड्यांचा हे लोक वापर करत होते.
जोर्वे संस्कृतीतील कुंभारकाम करणारे कारागीर एका विशेष भट्टीचा वापर करत असत, जी दगडी पायावर बांधलेली मातीची एक मोठी कुंड होती, ज्याचा व्यास १.७५ मीटर होता. अग्निकुंड भट्टीच्या पायथ्याशी होता आणि त्यावर वरून ६० मीटर खोलीवर मातीच्या गाद्या ठेवल्या होत्या. गरम वायूसाठी आउटलेट हवेच्या नळ्या आणि खोबणी तसेच मातीच्या गाद्यांवर छिद्रांच्या स्वरूपात प्रदान केले गेले होते.
१९५०–५१ साली केलेल्या उत्खननात येथे तांब्याच्या काटकोन चौकोनी व चपट्या कुऱ्हाडी, गारगोटींच्या छिलक्यांची शेकडो हत्यारे, राखी रंगाच्या मडक्यात पुरलेले लहान मुलांचे सांगाडे व तांबड्या पृष्ठभागावर काळ्या रंगात नक्षी काढलेली पक्क्या टणक भाजणीची व चाकावर घडविलेली तोटीची मृत्पात्रे सापडली. मृत्पात्रांत तोटीच्या मडक्याशिवाय वाडगे, कळशा इ. प्रकार आहेत. यांचा काळ सर्वसाधारणतः इ. स. पू. १५००–१००० असावा, असा तज्ञांनी प्रथम कयास केला परंतु या उत्खननानंतर अशाच तऱ्हेचा ताम्रपाषाणयुगीन पुरावा महाराष्ट्रात इतरत्र अनेक ठिकाणी मिळाला.
लहान मुलाचे दफनकुंभातील दफन, इनामगाव, अहमदनगर जिल्हा.
अशा तऱ्हेचा पुरावा प्रथम जोर्वे येथे सापडल्याने या मृत्पात्रांना ‘जोर्वे मृत्पात्रे’ व या संस्कृतीला ‘जोर्वे संस्कृती’ अशी नावे देण्यात आली. व ती आता प्रचलित झाली आहेत.
जोर्वे संस्कृतीची घरे मालवा संस्कृतीच्या घरांचे अनुकरण करत होती, ज्यामध्ये आयताकृती आराखडे, भिंती आणि शंकूच्या आकाराचे बांधकाम होते. घरांमधील अंतर गल्ल्यांचे सीमांकन करण्यात काही प्रमाणात नियोजन असल्याचे सूचित करते. इनामगाव येथे, वस्तीचा पश्चिमेकडील भाग कारागिरांचे निवासस्थान म्हणून काम करत होता, उत्खननात कुंभारकाम, हस्तिदंती कोरीवकाम, तांबे आणि सोने आणि चुना बनविण्याचे काम करणारे तज्ञ असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
सत्ता :-
कोणत्याही राजसत्तेचा येथे पुरावा सापडत नाही. पण गावाचा मुख्य व्यक्ती हा सर्व कारभार बघत असेल असा अंदाज आहे. दायमाबाद येथे सापडलेल्या मातृ मूर्तीमुळे हे लोक देखील मातृ सत्ता मानणारे होते हे लक्षात येते...
शेती :-
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटते की चार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी पिके घ्यायला सुरुवात झाली. विविध धान्य ,डाळी, कडधान्य ,तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव ,तांदूळ ,नाचणी, ज्वारी ,बाजरी ,राळ ,मसूर इत्यादी पिके ही माणसे घेत होती.गव्हाला जास्त पाणी लागते म्हणून इनाम गावच्या लोकांनी पुराचे पाणी जमिनीला भेटण्यासाठी पाट काढले होते. शेतीसाठीची अवजार हीदेखील उत्खननात मिळाली ..यात हरणाच्या शिंगापासून बनविलेले नांगर ,बैलाच्या हाडापासून बनविलेले नांगराचे काम करणारे पाते ,हरणाचे शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेले सीड ड्रील यांचा समावेश आहे ..अशाप्रकारे ही संस्कृती महाराष्ट्रात होती.
शेती, शिकार आणि मासेमारी हे उदरनिर्वाहाचे प्राथमिक स्रोत होते. पाळीव प्राण्यांमध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि डुक्कर यांचा समावेश होता. पाळीव आणि शिकार केलेले दोन्ही प्राणी खाल्ले जात होते आणि इनामगाव येथे आढळणाऱ्या मोठ्या अग्निकुंड्यांमध्ये शिजवले जात होते.
निवास व्यवस्था :-
गावाच्या मुख्य माणसाचे घर हे आयताकृती होते. तर बाकीच्या लोकांची घरे ही गोलाकार होती. जमिनीत धान्य साठवण्यासाठी खड्डे केलेले असत आणि त्यावर चुन्याने लेपण असे. हे लोक गावाभोवती तटबंदी बांधत होते. दायमाबाद येथील उत्खननात तटबंदी सापडली .तर इनामगाव येथे तटबंदी आणि खंदक दोन्ही सापडले. इमारतींच्या दुरुस्तीच्या पुराव्यावरून इनामगावच्या मध्यवर्ती भागातील घरे कदाचित श्रीमंत व्यक्तींची असतील. दैमाबादमध्ये मातीपासून बनवलेल्या बुरुजासह तटबंदीच्या भिंतीचेही अवशेष होते.
या संस्कृतीत प्रामुख्याने दगडी हत्यारे वापरली जात होती आणि त्यात विशेष ब्लेड आणि फ्लेक उद्योग होता, ज्यामध्ये चाल्सेडनी आणि अॅगेट सारख्या साहित्याचा वापर केला जात असे. तांबे आणि कांस्य यांचा वापर मर्यादित होता आणि त्यात कुऱ्हाडी, माशांच्या हुक, छिन्नी आणि चाकू यासारख्या अवजारांचा समावेश होता. इनामगावच्या जागेवरून चाल्सेडनीमधून तांबे काढण्यासाठी बांधलेल्या एका विशेष भट्टीचे पुरावे मिळाले, जे सध्याच्या इस्रायलमध्ये उत्खनन केलेल्या कांस्ययुगीन भट्टींशी शैलीत्मक साम्य दर्शवते. संस्कृतीच्या कलाकृतींमध्ये सूक्ष्म दगड, तांब्याच्या वस्तू, मणी आणि टेराकोटाच्या मूर्तींचा समावेश होता. टेराकोटाच्या कलाकृतींमध्ये घोड्याने ओढलेल्या रथाचे चित्रण करणारा एक सिलेंडर सील होता. वैयक्तिक दागिन्यांमध्ये कवच, हस्तिदंत आणि तांब्याच्या बांगड्या तसेच चाल्सेडनी, अॅगेट, जास्पर आणि कार्नेलियनपासून बनवलेले दागिने समाविष्ट होते. जोर्वे याठिकाणी ब्राँझच्या सहा कुऱ्हाडी आणि एक तांब्याची बांगडी सापडली. कुऱ्हाडी ची लांबी 66 मि मी , तर रुंदी 56 मी मी इतकी होती. यातील तांब्याचे प्रमाण हे 97% तर बाकी कथील धातु होते. विद्वानांच्या मते, सोनेकाम आणि हस्तिदंतीतील कारागिरांची उपस्थिती, तसेच दागिन्यांमध्ये शंखाचा वापर यावरून असे सूचित होते की जोर्वे संस्कृतीचा आसपासच्या प्रदेशांशी संपर्क होता. शंख कच्छ आणि कोकण किनाऱ्यांवरून आला असावा आणि हस्तिदंत आणि सोने सध्याच्या कर्नाटकातून आले असावे. इनामगाव आणि दैमाबाद ही मातीकामाची केंद्रे देखील असू शकतात, जी संस्कृतीच्या इतर ठिकाणी वस्तूंचा पुरवठा करत असत. मध्य प्रदेशातील नवदातोली आणि कर्नाटकातील टी नरसीपुरा येथे जोर्वे मातीकामाची उपस्थिती उत्तर आणि दक्षिणेकडील प्रदेशांशी सांस्कृतिक संबंध असल्याचे सूचित करते.या ठिकाणाहून सापडलेल्या काही टेराकोटाच्या वस्तूंना धार्मिक किंवा धार्मिक महत्त्व असल्याचे मानले जाते.
अंतिम संस्कार :-
हे लोक अगदी विलक्षण पद्धतीचा अंतिम संस्कार करत असत .लहान बाळाला माठामध्ये भरून ते पुरत होते .तर वयस्कर माणसाला रांजणा मध्ये भरून दक्षिण उत्तर गाडत असत .ते वेळेस डोके दक्षिणेला ठेवत .हे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत होते कारण पुरताना ते माणसाचे पाय घोट्यापासून कापून टाकायचे .कारण त्यांना अशीच शंका असायची की माणसाचे भूत होऊ नये .पुरताना प्रेतासोबत ते धान्यही गाडत असत. विशेष म्हणजे त्याकाळात स्मशानभूमी नव्हत्या तर हे लोक राहत्या घरातच प्रेताला गाडत होते. गावच्या मुख्य माणसाला रांजणा मध्ये बसवून गाडीत होते .त्यावेळेस त्याचे तोंड उत्तरेला ठेवत होते.
जवळपास १००० वर्षे ही संस्कृती टिकली. इस.पूर्व १००० नंतर इथल हवामान देखील प्रचंड बदलले. या प्रतिकूल वातावरणामुळे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांना एकेठिकाणी वस्ती करून स्थिर जीवन जगणे अशक्य बनले. त्यामुळे हा महाराष्ट्राचा आद्य बळीराजा परत कंदमुळे आणि शिकारीच्या शोधात हा भाग सोडून बाहेर पडला. या वसाहती रिकाम्या झाल्या. त्यांनतर मात्र या भागात तीन हजार वर्षे कोणीही वस्ती केली नाही यामुळे हे अवशेष जमिनी खाली शाबूत राहिले.
नेवासा वसाहत अश्मयुगीन मानवाची :-
नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. इथंच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती झाली. या घटनेची साक्ष असलेला ‘पैस खांब’ आजही भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत अखंडपणानं चेतवत उभा आहे. नेवासा पवित्र स्थळ आहे. गावात असणारी दुसरी आकर्षक धार्मिक वास्तू म्हणजे मोहिनीराज मंदिर. पण, फार कमी लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या सर्वांत पहिल्या मानवाचं अस्तित्व या गावात होतं. नेवासा अश्मयुगीन मानवाच्या वसाहतीचं ठिकाण आणि अतिशय महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय पुरातत्त्वचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ह. धी. सांकलिया यांना एका प्रश्नाची उकल होत नव्हती. भारतात अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय स्थळांचे शोध लागत होते, शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणांचं उत्खनन होत होतं. उत्तर तसेच दक्षिण भारतात आदिमानवाच्या पाऊलखुणा आढळत होत्या. पण महाराष्ट्रात मात्र अशा ठिकाणाचा शोध सुरूच होता. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी आदिमानवाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झाले होते. पण, रामायण काळापासून कायम चर्चेत राहिलेला भाग, मात्र आदिमानव तिथं राहत होता का, याविषयी इतिहास अनभिज्ञ होता. महाराष्ट्र या नावाचा सर्वांत पुरातन लिखित स्वरूपातील उल्लेख सापडतो उत्तर कर्नाटकाच्या ऐहोळे गावात, तिथल्या मेगुती मंदिरावर असलेल्या शिलालेखात.
त्याआधीपासून महाराष्ट्रात मानवी वस्ती होती. पण त्या मानवाच्या अस्तित्वाचं स्वरूप काय होतं, याविषयी अभ्यासक निरनिराळे तर्क लावत, अंदाज बांधत असत. नेवासा गावापासून काही किलोमीटरवर वाहणाऱ्या चिरकी ओढ्याच्या काठी पांढरीचं टेकाड असल्याची बातमी समजली. हा चिरकी ओढा प्रवरा नदीला जाऊन मिळतो. पुरातत्त्व संशोधकांचा एक समूह त्या जागी गेला. तिथं जमिनीवर आढळणाऱ्या काही पुरावषेशांचा अभ्यास करून उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळं दख्खनच्या इतिहासाचं संपूर्ण स्वरूप बदललं. या ठिकाणी डॉ. सांकलिया सरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० ते ६० या दशकात शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील आद्य मानवाच्या खुणा हाताशी लागल्या. आद्य पुराश्मयुगातील मानवाच्या अस्तित्वाचे धागेदोरे सापडले. त्यामध्ये काही दगडी हत्यारं सापडली. दगडी हत्यारं बनवण्यासाठी लागणारा सर्वांत उत्तम प्रकारचा दगड म्हणजे गारगोटी. उत्तर भारतात तो विपुल प्रमाणात उपलब्ध होता. त्यापासून दगडी हत्यारे तयार करणं, त्यांना आकार देणं, वापर व्यवस्थित होईल अशी धार तयार करणं या दगडावर सोपं जाई. महाराष्ट्रात सर्वत्र बेसाल्ट. त्याला धार लावणं किंवा त्यापासून दगडी हत्यार बनवणं, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य न होणारी गोष्ट होती. पण त्या वेळेच्या मानवाला दगडांचं उत्तम ज्ञान होतं. जमिनीतून निघालेला लाव्हारस थंड झाल्यावर त्याच्या भिंती बनत असत. त्यांना आपण डाईक असं म्हणतो. हे आकारानं लांब, पसरट पण चपटे असत. त्यामुळं त्यांचा वापर करून महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवानं दगडी हत्यारं केली. नेवासा इथं उत्खनन करण्यात आलं, तेव्हा या डाईक पासून बनवलेली बरीच हत्यारं उपलब्ध झाली. भारतात मानवाचं अस्तित्व लाखो वर्षांपासून आहे. त्या वेळेचा मानव हा दगडी हत्यारं तयार करत असे. त्यांच्या साहाय्यानं तो तोडणं, कापणं, भोसकणं, तुकडे करणं, छिद्र पाडणं यांसारख्या गोष्टी करत असे. नेवासा इथं तशाच स्वरूपाची हत्यारं सापडली. दगडी हत्यारांना घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रावरून आणि त्यांच्या आकारावरून त्या त्या काळाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नेवासा येथे सापडलेल्या दगडी हत्यारांवरून महाराष्ट्रात अस्तित्वात असणारा पहिला मानव हा आद्य पुराश्मयुगीन काळातील आहे, हे सिद्ध झालं. चिरकी ओढ्याकाठी झालेल्या या उत्खननानं महाराष्ट्राचा इतिहास लाखो वर्षे मागं गेला आणि सोबतच, अनेक नवीन पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. पण या पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध झाले असले, तरीही त्याची शरीररचना कशी असावी याविषयी उत्तर देण्यासाठी एकही मानवी सांगाडा सापडला नाही. उत्खनन केल्यामुळं या जागेचा आदिमानव ते मध्ययुगीन कालखंडपर्यंतचा नेवासा पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पुरातत्त्वीय संशोधनाच्या आधारे मांडणं सोपं गेलं. आद्य पुराश्म, मध्य पुराश्म, नवाश्म यांसारख्या मानवी विकासाच्या टप्प्यांचा शोध या उत्खननातून लागला. पुढं, १९६०-७० मध्येही या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं, मानव शेती करू लागला त्या काळातील खापराची भांडी, चूल, धान्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली मोठमोठाली भांडी, मणी, बांगड्या, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या वस्तू यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्या. महाराष्ट्रात शेती होऊ लागली, तेव्हा मानव एका जागी स्थिर झाला. त्याचं दैनंदिन आयुष्य एकाच जागेभोवती फिरू लागलं. त्या वेळेस झालेल्या दफनांमुळं आपल्याला त्या शेती करणाऱ्या आद्य शेतकऱ्यांचे मानवी सांगाडे उपलब्ध झाले आहेत. पण, त्याच्याही आधी वास्तव्य करणाऱ्या या आद्य मानवाचे मात्र पुरावे नेवासा इथून मिळाले नाहीत. वातावरणातील बदल आणि पाण्याची कमी-जास्त प्रमाणात असणारी उपलब्धता, नैसर्गिक संकटे यामुळे आद्य पुराश्मयुगीन काळानंतर ही जागा ओस पडली असावी. पण नंतर इथे मध्य पुराश्मयुगीन काळातील मानवाचे अस्तित्व आढळते. पुढं शेती करणारा मानव, त्याच्यानंतर प्राचीन, पूर्व मध्ययुगीन ते मध्ययुगीन कालखंडातील मानवाच्या खुणा एकसलग आढळतात. नेवासासारख्या ठिकाणी एवढ्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्यानं महाराष्ट्राचा मानवी अस्तित्वाचा आद्य ते सद्यःस्थितीपर्यंतचा इतिहास एकसलगपणे समजून घेण्यास फार मदत होते. आज हे स्थळ चिरकी नाला किंवा चिरकी नेवासा या नावानं पुरातत्त्वीय स्थळांच्या यादीत प्रसिद्ध आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात असणाऱ्या संग्रहालयात डॉ. ह. धी. सांकलिया सरांनी केलेल्या उत्खननाची व त्याच्या स्थरांची प्रतिकृती उभी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आद्य मानवाच्या वस्तींपैकी नेवासा हे महत्त्वाचे स्थळ म्हणून आजही आपले महत्त्व टिकवून आहे.
दायमाबाद (Daimabad)
महाराष्ट्रातील प्राचीन अवशेषांचे एक स्थळ. ताम्रपाषाणयुगीन सावळदा संस्कृती ते जोर्वे संस्कृती या दरम्यानच्या सांस्कृतिक कालखंडांची सलग माहिती येथे मिळत असल्याने, तसेच सिंधू संस्कृतीच्या उत्तर हडप्पा काळातील सर्वांत दक्षिणेकडील पुरातत्त्वीय स्थळ असल्याने दायमाबादला भारतीय पुरातत्त्वीय इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे.
महाराष्ट्रातल्या आद्य मानवी वसाहतींची संस्कृती ‘जोर्वे-नेवासे’ संस्कृती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. गोदावरीची उपनदी असलेल्या प्रवरा या मोठ्या नदीच्या डाव्या तीरावर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर, तर श्रीरामपूर या शहरापासून १८ किमी. अंतरावर आग्नेय दिशेस दायमाबाद असून त्या ठिकाणी सध्या वसती नाही.
दायमाबाद येथील ब्राँझच्या वस्तू.
दायमाबाद इथे जोर्वे संस्कॄतीचे अवशेष सापडले कसे ? याची हकीकत मनोरंजक आहे. दायमाबादच्या बाबतीत एक नाट्यमय घटना घडली होती. १९७४ मध्ये छबू लक्ष्मण भील नावाच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातले एक झुडूप मुळासकट काढताना, त्याच्या मुळाशी चार ब्रॉन्झच्या मूर्ती सापडल्या. त्या घेऊन तो गावातले सुशिक्षित आणि सामाजिक कार्यात भाग घेणाऱ्या लाल हुसेन पटेल यांच्याकडे गेला. त्यांनी त्या वस्तू भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागापर्यंत पोचवल्या. त्यात एक रथ किंवा बैलगाडी म्हणता येईल असे शिल्प होते. दोन बैल जोडलेल्या या गाड्यावर एक माणूस उभा आहे आणि गंमत म्हणजे गाडी आणि बैल यांच्या मधल्या दांड्यावर एक कुत्रा आहे. याखेरीज हत्ती, म्हैस आणि गेंडा यांचेही गाडे आहेत. त्यातले रथाचे शिल्प सध्या राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे आहे तर बाकी शिल्पे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात आहेत.
सुरवातीला या मुर्ती सापडल्यावर श्रीरामपूरच्या पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञानी जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सिंधू संस्कृतीला समकालीन अवशेष आहेत.
गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रवरा नदी जवळ दायमाबाद येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका ओळीत आखणी केलेली कच्च्या विटांची घरे सापडली. यात धान्य साठवण्यासाठी वेगळी खोली, गुरांचा गोठा देखील आढळून आला. याचाच अर्थ हा शेतकरी पशुपालनाला देखील तितकेच महत्व देत होता,हे हजारो वर्षापूर्वीचे शेतकरी त्याकाळच्या मानाने प्रगत होते. शेतीसाठी ते लाकडी नांगर वापरायचे. नदीच्या पाण्याचा वापर ते सिंचनासाठी करत. त्याकाळात त्यांनी गहू, तांदूळ, बार्ली, मसूर,वाटाणे, तीळ या पिकाच उत्पादन घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. या शेतकऱ्याच्या स्वैपाकघरात चुली होते. त्यांची भांडी मात्र भाजून बनवलेली होती. यात लहानमोठे घडे, रांजण,वाडगे देखील होते. त्यांना रंगवलेही जात होते. त्याकाळच्या कुभाराची भट्टीदेखील सापडली आहे. तिथेही ताम्रपाषाण युगातली मातीची भांडी आणि गारगोटीच्या पातळ तुकड्यांची हत्यारे सापडली आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा पुरातन कालाचा पुरावा पहिल्यांदा जोर्वे येथे सापडला. नंतर नेवासे येथे झालेल्या उत्खननात ह्या संस्कृतीवर अधिक प्रकाश पडला म्हणून या संस्कृतीचे नाव ‘जोर्वे-नेवासे’ संस्कृती ! ह्या संस्कृतीचा काळ साधारण ख्रिस्तपूर्व बाराशे ते पंधराशे वर्षे असावा. इथे सापडलेली भांडी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ही मातीची भांडी तुलनात्मकदृष्ट्या पातळ आहेत. भट्टीमध्ये उत्तम प्रकारे भाजलेली असल्यामुळे त्यांचा धातूच्या भांड्यांप्रमाणे टणटण् आवाज येतो. विटकरी रंगाच्या त्या भांड्यांवर इतर पुरातत्त्वीय ठिकाणी आढळणाऱ्या भांड्यांप्रमाणे प्राण्यांची चित्रे काढलेली आहेत. क्वचित एखाद्या भांड्यावर स्वस्तिकाचे चिन्ह काढलेले आहे. असे स्वस्तिकाचे चिन्ह हे महाराष्ट्रात इतरत्र किंवा दक्षिण भारतात सापडण्याआधी येथेच प्रथम आढळून आले आहे. चार संस्कृतींचे माहेरघर असणाऱ्या दायमाबाद मध्ये कास्याच्या मूर्ती सापडल्या .त्यामध्ये कास्या चा रथ ,गेंडा, हत्ती चित्ता इत्यादी गोष्टी आहेत. त्याच बरोबर तत्कालीन एक विहीरही सापडली आहे. ‘जोर्वे-नेवासे’ संस्कृतीमध्ये मृतांना रांजणात घालून पुरण्याची पद्धत होती. दफन करताना मोठमोठ्या दगडी शिळांचा आणि फरश्यांचा वापर करत असत. मृतांचे स्मारक म्हणूनही शिळावर्तुळे उभारत. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणीही अशी शिळावर्तुळे आढळून येतात. मृतांच्या शेजारी त्यांच्या परिस्थितीप्रमाणे भांडीकुंडी ठेवत असत. नेवाशाला एक तांब्याच्या मण्यांची माळ रेशमाच्या आणि सुताच्या धाग्यात गुंफलेली सापडली. अशा प्रकारे रेशीम आणि सूत यांचे संमिश्र सूत भारतात प्रथमच सापडले. आद्य शेतकऱ्यांच्या भरभराटीला आलेल्या या वसाहती वातावरणातल्या बदलामुळे इसवी सनपूर्व पाचशेच्या आसपास नष्ट झाल्या असाव्यात. दायमाबादची वसाहत हे उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे स्थळ आहे. तेथे टेराकोटाचे तीन शिक्के (सील) सापडले आहेत, ज्यांच्यावर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले चिन्ह आहे. मातीच्या भांड्यांच्या काही तुकड्यांवरही सिंधू लिपीतली चिन्हे सापडली आहेत. दायमाबादमध्ये मातीपासून बनवलेल्या बुरुजासह तटबंदीच्या भिंतीचेही अवशेष होते. या स्थळाचा शोध भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे बी. पी. बोपर्डीकर यांनी लावला. दायमाबाद येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे १९५८-५९ (नेतृत्व : म. न. देशपांडे), १९७४-७५ (नेतृत्व : एस. आर. राव) व पुन्हा १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये (नेतृत्व : एस. एस. साळी) असे एकूण चार वेळा उत्खनन करण्यात आले असून या उत्खननांमधून ताम्रपाषाणयुगीन दायमाबाद विषयी भरपूर माहिती मिळाली आहे. दायमाबाद येथील पहिली दोन उत्खनने मर्यादित स्वरूपाची होती व नंतर मिळालेल्या पुराव्यांमुळे त्या वेळी काढलेल्या निष्कर्षांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.सापडलेल्या त्या मुर्त्या इ.स. पूर्व २२००-२००० म्हणजेच जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वीच्या होत्या. आता ही ‘साईट’ (स्थळ) बंद करण्यात आली आहे.
पहिल्या उत्खननात एकूण तीन कालखंडांतील वसाहतीचे पुरावे मिळाले होते.
पहिल्या कालखंडाच्या निक्षेपात जास्त प्रमाणात मिळालेली मृद्भांडी राखाडी
रंगांची होती. या मृद्भांड्यांत व ब्रह्मगिरी (कर्नाटक) येथे मिळालेल्या
मृद्भांड्यांमध्ये साम्य होते. दुसऱ्या कालखंडांत माळवा संस्कृतीची
मृद्भांडी आढळली होती, तर तिसऱ्या कालखंडात जोर्वे संस्कृतीची मृद्भांडी
मिळाली होती; परंतु १९७५-७६ व १९७८-७९ मध्ये शंकर साळी यांनी केलेल्या
उत्खननात दायमाबादला एकूण पाच कालखंडांत वसाहत झाल्याचे दिसून आले. या
उत्खननानुसार शंकर साळी यांनी दिलेला सांस्कृतिक कालक्रम खालीलप्रमाणे आहे :
कालखंड – ५ जोर्वे संस्कृती
कालखंड – ४ माळवा संस्कृती
कालखंड – ३ दायमाबाद संस्कृती (फिकट तपकिरी-पिवळसर रंगाची मृद्भांडी)
कालखंड – २ उत्तर हडप्पा संस्कृती
कालखंड – १ सावळदा संस्कृती
दायमाबादच्या नमुन्यांच्या रेडिओकार्बन तिथी उपलब्ध असून त्यांमधील काही
सर्वसाधारणपणे इनामगावसारख्या इतर पुरातत्त्वीय स्थळांवरील रेडिओकार्बन
तिथींशी मिळत्याजुळत्या आहेत. काही रेडिओकार्बन तिथी संदूषणामुळे
परस्परविरोधी होत्या.
दायमाबाद येथील चित्रित भांडे.
सावळदा कालखंड :
दायमाबादची पहिली वसाहत सावळदा संस्कृतीच्या लोकांची होती; परंतु
वसाहतीचा विस्तार मर्यादित म्हणजे अंदाजे ३ हेक्टर होता व ही वसाहत
नदीकाठच्या काळ्या मातीच्या अरुंद पट्ट्यात होती. या कालखंडातील घरे
मातीच्या भिंतीची असून घरांमध्ये एक, दोन किंवा तीन खोल्या आढळल्या. एक
खोली असणारे सर्वांत छोटे घर ३. ४ मी. लांब व १.६ मी. रुंदीचे होते. तर
सर्वांत मोठे घर ७ मी. लांब व ५ मी. रुंदीचे होते. घरातील जमीन काळी-पिवळी
माती वापरून बनवत असत. काही घरांमध्ये सुशोभिकरणासाठी गोड्या पाण्यातील
शिंपल्यांचा वापर केला असल्याचे दिसते.
सावळदा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू कमी प्रमाणात वापरत असावेत. या
काळातल्या पुरावशेषांमध्ये दगडाचे पाटे-वरवंटे, कार्नेलियन व अगेटचे मणी,
तीराग्रे व गारगोटीपासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे यांचा समावेश आहे. सावळदा
कालखंडातील मृद्भांडी मध्यम पोताची व कमी गतीच्या चाकावर बनवलेली आहेत.
त्यांच्यावर तपकिरी अथवा चॉकलेटी रंगाचा दाट लेप दिलेला आढळतो.
मृद्भांड्यांवर प्रामुख्याने लाल रंगात हत्यारे, अवजारे, हरिण, मासे,
वनस्पती व भौमितिक आकार असे विविध चित्रण केलेले दिसते. काही
मृद्भांड्यांवर काळ्या व पांढऱ्या रंगांत चित्रे आहेत. या मृद्भांड्यांना
सावळदा मृद्भांडी असे म्हणतात. या मृद्भांड्यांखेरीज तकाकी आणलेली करडी व
हाताने बनवलेली जाड तांबडी मृद्भांडी देखील मिळाली आहेत. सावळदा कालखंडातील
लोक अनेक धान्ये पिकवत असत. या काळातल्या निक्षेपात बार्ली (सातू),
वाटाणे, मसूर, हरभरा व कुळीथ यांचे अवशेष मिळाले आहेत.
उत्तर हडप्पा कालखंड :
उत्तर हडप्पा कालखंडात दायमाबादच्या वसाहतीचा आकार वाढलेला दिसतो. तो २०
हेक्टर असावा, असा अंदाज बांधण्यात आला आहे. या कालखंडाचे वैशिष्ट्य
म्हणजे दायमाबादला प्रथमच कच्च्या विटांचा उपयोग सुरू झाला. एका फुटलेल्या
कच्च्या विटेची लांबी ३० सेंमी. व जाडी ८ सेंमी. असल्याचे दिसून आले आहे.
कच्च्या विटांची भिंत बनवताना विटा सांधण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला
होता. थडग्यांसाठीही कच्च्या विटांचा वापर केला गेला होता. थडग्यांसाठी
वापरलेल्या विटांचे दोन आकार आढळले. या दोन्ही प्रकारच्या विटांच्या लांबी,
रुंदी व जाडीचे गुणोत्तर ४:२:१ असेच होते.
उत्तर हडप्पा कालखंडात जाड, दणकट, जलद चाकावर बनवलेली आणि उत्तम पोताची
तांबडी मृद्भांडी मिळाली. या मृद्भांड्यांचा गाभा लाल अथवा विटकरी रंगाचा
असून मऊ मातीत रेती व चुना मिसळून ही तयार केली असल्याचे दिसते. बाहेरच्या
बाजूस तपकिरी अथवा लाल रंगाचा दाट लेप दिलेला आहे. या मृद्भांड्यांवर
काळ्या रंगाने अनेक प्रकारची चित्रे काढलेली आहेत. या मृद्भांड्यांचे आकार
विविध असून त्यात मणिसम काठ असणारे घडे, सपाट बुडाचे घडे, स्टँडवरच्या
थाळ्या व वाडगे यांचा समावेश आहे.
दायमाबादच्या वसाहतीचा उत्तर हडप्पा संस्कृतीशी असणारा संबंध स्पष्ट
करणारे पुरावे दोन घरांमध्ये मिळाले आहेत. घर क्रमांक १६ मध्ये गुंडीच्या
आकाराची मातीची मुद्रा मिळाली. या मृण्मुद्रेवर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले
एक चिन्ह आहे. त्याचप्रमाणे बाजूच्या घर क्रमांक १७ मध्ये अशाच प्रकारची
सिंधू लिपीतील दोन चिन्हे असणारी मृण्मुद्रा मिळाली. या खेरीज
मृद्भांड्यांच्या तीन तुकड्यांवर सिंधू लिपीतील चिन्हे आढळली. या कालखंडात
मृद्भांड्यांचा वैशिष्ट्यपूर्ण तुकडा मिळाला. या चंद्रकोरीसारख्या
आकाराच्या तुकड्याच्या कडा घासून गोलाकार केल्या आहेत. या तुकड्यावर वाघ
म्हैस/रेड्यावर पाठीमागून हल्ला करत असल्याचे चित्रण आहे. या खेरीज तांबे
अथवा ब्राँझची कुऱ्हाड व सोने-शिसे यांचा एक मणीदेखील उत्तर हडप्पा
संस्कृतीच्या निक्षेपात मिळाले आहेत.
रेडिओकार्बन तिथींच्या साक्षेपी अभ्यासावरून असे दिसते की, उत्तर हडप्पा
कालखंड अपेक्षेनुसार इ. स. पू. १८०० (१७६० अधिकउणे २१०) होता.
माळवा संस्कृतीचा कालखंड :
या कालखंडातील (कालखंड-३) निक्षेपात वैशिष्ट्यपूर्ण अशा फिकट
तपकिरी-पिवळसर रंगाच्या मृद्भांड्यांचे अवशेष मिळाले आहेत. ही या
संस्कृतीची ओळख पटवणारी खूण आहे, असे उत्खननकर्ते शंकर साळी यांचे मत असले,
तरी ते इतर अभ्यासकांनी ग्राह्य मानलेले नाही. ही मृद्भांडी मध्यम पोताची,
कमी गतीच्या चाकावर बनवलेली व कमी भाजलेली आहेत. ही भांडी तयार करण्यासाठी
बनवलेल्या मातीत वनस्पतीजन्य पदार्थांचा वापर केलेला आहे. बाह्य लेप अतिशय
पातळ असून अनेक ठिकाणी लेपाचे पोपडे निघालेले दिसतात. या मृद्भांड्यांवर
काळ्या रंगाने अनेक प्रकारची चित्रे काढलेली दिसतात. दायमाबादला तिसऱ्या
कालखंडात मिळालेल्या मृद्भांड्यांच्या प्रकारावरून या कालखंडाचे दायमाबाद
संस्कृतीचा कालखंड असे नामकरण करण्यात आले असले, तरी या संस्कृतीची फारशी
माहिती उपलब्ध नाही. आता ही वेगळी संस्कृती आहे, हे मत कालबाह्य झालेले
असून शंकर साळी यांनी दायमाबाद संस्कृतीचा म्हणून वर्णन केलेला थर हा माळवा
संस्कृतीचा प्रारंभिक थर आहे, असे आता मानले जाते.
माळवा संस्कृतीच्या निक्षेपात अनेक घरांचे अवशेष मिळाले आहेत. माती व
कुडाची घरे या काळात प्रचलित होती. तसेच आयताकृती आकाराची ही घरे प्रशस्त
असून दरवाजासमोर आयताकृती अथवा अर्धचंद्राकाराच्या पायऱ्या असत. घरांच्या
भिंतींची जाडी ८ ते ३० सेंमी. असल्याचे दिसून आले. माळवा संस्कृतीच्या
वैशिष्ट्यपूर्ण मृद्भांड्यांशिवाय या काळातील निक्षेपात काळी-लाल व राखी
रंगाची चकचकीत मृद्भांडी मिळाली आहेत. या काळात मिळालेल्या अनेक घरसदृश
रचना यांचा संबंध धार्मिक बाबींशी असावा, असे त्यात मिळालेल्या
अग्निकुंडांवरून मानले जाते. तसेच एका घरात दोन चुली व एक तांब्याचे पाते
मिळाले असल्याने ते तांबटकाम करणाऱ्याचे घर असावे, असे मानले गेले आहे.
जोर्वे संस्कृतीचा कालखंड :
दायमाबाद येथील वसाहतीचा हा शेवटचा कालखंड असून त्यात जोर्वे संस्कृतीची
नमुनेदार मृद्भांडी मिळाली आहेत. त्यांचा रंग गडद लाल असून त्यांच्यावर
चित्रे काढलेली दिसतात. या कालखंडात वसाहतीचा आकार वाढून तो ३० हेक्टर एवढा
झाला असला, तरी एकूण आकृतीबंधात फारसा फरक पडलेला दिसत नाही. उपलब्ध
पुराव्यांचा विचार करता, माळवा संस्कृतीच्या मृद्भांड्यांमधून जोर्वे
संस्कृतीची मृद्भांडी उत्क्रांत झाली, असे मत मांडण्यात आले आहे. जोर्वे
सांस्कृतिक थरांमध्ये पाच काळातील रचना मिळाल्या आहेत. यातील चौथ्या रचनेत
फक्त गोलाकार घरे होती; तर इतर मात्र चैाकोनी अथवा आयताकृती होती.
पूर्वीच्या काळामधील पिके या काळातही घेतली जात होती. तसेच या थरांमध्येही
सूक्ष्मास्त्रे मिळतात. जोर्वे थरात एक दंडगोलाकृती मुद्रा मिळाली असून
त्यावर घोडा जोडलेल्या रथाचे चित्रण आहे. तसेच मातीच्या एका वस्तूवर ऋषीचे व
त्याच्या शिष्यगणाचे चित्रण असल्याचे उत्खनन करणाऱ्यांचे मत असले, तरी ते
सर्वमान्य झालेले नाही.
ब्राँझच्या वस्तू :
दायमाबादला जमिनीत खणत असताना काही मेंढपाळांना योगायोगाने ब्राँझच्या
चार वस्तू (एकूण वजन ६० किग्रॅ.) मिळाल्या. या वस्तू (बैल जुंपलेला रथ,
रेडा, गेंडा व हत्ती) आता ’दायमाबाद ब्राँझेस म्हणून ओळखल्या जातात. या चार
वस्तू अत्यंत सुस्थितीत असून त्यांना चाके आहेत. या अत्यंत कलात्मक
बनावटीच्या वस्तू कोणत्या काळातील आहेत, याबद्दल संशोधकांमध्ये एकमत नाही.
मधुकर केशव ढवळीकर त्यांना हडप्पा संस्कृतीच्या मानतात. या वस्तूंमध्ये
अर्सेनिक या मूलद्रव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यावरून डी. पी. अग्रवाल यांनी
या वस्तूंच्या हडप्पा सांस्कृतिक संदर्भाबद्दल शंका व्यक्त केली आहे.
उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून दिलीप चक्रवर्ती यांनी दायमाबादच्या
ब्राँझच्या वस्तू अरवली पर्वताराजीच्या प्रदेशातून दख्खनमध्ये आल्या
असाव्यात, असे म्हटले आहे.
इनामगाव :-
महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर पहिली तर तिचे मानवाच्या संस्कृतीच्या विकासामध्ये योगदान आपल्याला दिसून येते. मानवी शरीरात जशा धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात त्याच प्रकारे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्राचे पोषण करतात. महाराष्ट्रातील नद्यांचे योगदान मानवाच्या विकासासाठी फार मोठे कारण आहे. याच नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते. मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते.आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. असेच महाराष्ट्रातील एक पुरातत्व स्थळ म्हणजे घोड नदीचे काठचे इनामगाव.
पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता असे मानतात की सिंधू–सरस्वती संस्कृतीतील वस्त्या तेथे उपलब्ध असलेले जलस्रोत हळूहळू आटत गेल्याने पूर्वेकडे व दक्षिणेकडे सरकू लागल्या व यापैकी काही वस्त्या मध्य प्रदेशातील माळवा भागात स्थिरावल्या होत्या. इनामगाव मध्ये सर्वात प्रथम वस्ती करण्यास आलेले माळवा संस्कृतीतील मानव,हे या माळवा भागाकडून आलेले होते. या वरून असा निष्कर्ष काढणे फारसे चूक ठरणार नाही की मूळ सिंधू–सरस्वती खोर्यातून आलेल्या लोकांच्या वस्त्यांपैकी काही वस्त्या पुढे आणखी दक्षिणेला म्हणजे दख्खनच्या पठारावर सरकल्या व इनामगाव सारख्या अनेक ठिकाणी येऊन स्थिरावल्या,किंबहुना इनामगाव मधील माळवा संस्कृतीतील वस्ती ही मूलत: सिंधू–सरस्वती संस्कृतीतील लोकांची होती. इनामगाव येथे उत्खनन झालेल्या माळवा संस्कृती घरांमध्ये सापडलेल्या आणि स्त्रीफलोधारणेचे प्रतीक असलेल्या स्त्री मूर्तींचे याच प्रकारच्या सिंधू–सरस्वती संस्कृतीमधील वस्त्यांमध्ये सापडलेल्या मूर्तींशी असलेले साधर्म्य लक्षात घेतले तर हा निष्कर्ष योग्य आहे असेच वाटते.
इनामगावमध्ये अनेक टप्प्यांत वस्ती होती, ज्यामध्ये वसाहतीच्या पद्धती आणि दफन पद्धतींमध्ये उत्क्रांती दिसून येते. सर्वात जुना टप्पा माळवा संस्कृतीच्या प्रभावाशी संबंधित आहे, त्यानंतर मुख्य जोर्वे संस्कृतीचा काळ येतो.ई.स.पूर्व ७०० या जागेचा नाश झाला, कदाचित हवामान बदलांमुळे किंवा शेतीवर परिणाम करणाऱ्या इतर पर्यावरणीय घटकांमुळे.
एक ओकंबोकं गाव आहे.उजाड आहे.वैराण आहे. गावाचं नाव इनामगाव. खरंतर या गावाचं मूळ नाव काय हे कुणालाच कधीच ठाऊक नाहीये. शेजारच्या इनामगावच्या शिवाराच्या हद्दीत येतं म्हणून याचंही नाव इनामगावच. पण हे गाव नेहेमीच असं उजाड ओसाड नव्हतं. खूप खूप शतकांपूर्वी, काही सहस्रकांपूर्वी इथे एक नांदतंजागतं नदीकाठाच्या आसर्याने राहणारं गाव होतं. तर त्या गावाची ही कहाणी. महाराष्ट्रातल्या, दख्खनमधल्या पहिल्यावहिल्या ज्ञात जलसंधारण तंत्रज्ञानाची कहाणी. इनामगाव हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे. दख्खन प्रदेशातील सुरुवातीच्या शेती समुदायांबद्दल महत्त्वपूर्ण पुरावे देण्यासाठी हे विशेषतः ओळखले जाते. हे स्थळ आपल्याला हजारो वर्षांपूर्वी जगलेल्या लोकांच्या जीवनाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि पद्धतींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देते. इनामगावचे महत्त्व इनामगाव हे जोर्वे संस्कृतीशी संबंधित एक प्रमुख स्थळ आहे, जे महाराष्ट्रातील तांबेयुगातील संस्कृती आहे, जी अंदाजे १४०० ते ७०० ईसापूर्व आहे. इनामगाव येथील उत्खननातून असे दिसून आले आहे: इनामगावचे स्थान इनामगाव पुरातत्व स्थळ विशेषतः घोड नदीच्या काठावर वसलेले आहे. घोड नदी ही भीमा नदीची उपनदी आहे, जी मोठ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. नदीजवळील स्थान सुरुवातीच्या वसाहतींसाठी महत्त्वाचे होते, ज्यामुळे शेती, पिण्यासाठी आणि इतर दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होते.
भीमेची उपनदी घोड. अगदीच तीव्र उन्हाळा सोडला तर एरवी बर्यापैकी पाणी असणारी. तिच्या एका वळणावर इनामगाव वसले आहे. पांढरीचा एकूण परिसर पंचवीस एकरांच्या आसपास. इ.स.पू. १६०० च्या सुमारास इथे प्रथम माणसं कायमस्वरूपी वस्तीला आली असे दिसते. ते थेट पुढची जवळपास हजार वर्षे. किती पिढ्या आणि जीवनाच्या नदीची किती वळणे गावाने बघितली असतील ते फक्त त्या पांढरीलाच ठाऊक. आपल्याला माहित ते फक्त त्यांच्या घरांबद्दल, कारागिरीबद्दल, भांड्याकुंड्यांबद्दल; कुठली धान्ये पिकत, कुठले प्राणी पाळत, कुठली शिकार करत यांबद्दल. पुरातत्वीय तांत्रिक परिभाषेत त्याचे तीन सांस्कृतिक उपकालखंड पडतात - माळवा, पूर्व-जोर्वे आणि उत्तर-जोर्वे कालखंड. त्यातील पूर्व-जोर्वे कालखंड हा सगळ्यात भरभराटीचा सुबत्तेचा होता. थोडक्यात आढावा घ्यायचा तर कुडांच्या एक-दोन-तीन खोल्यांच्या अंगण असलेल्या घरात राहणारी ही कुटुंबे गाई-बैलांची-म्हशींची खिल्लारं आणि शेळ्या-मेंढ्यांचे कळप राखत. त्याचबरोबर डुकरं, कोंबडी, कुत्री असेही प्राणी गावात असत. दख्खनच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पीकपद्धतीचा उगम याच काळात झाला असे दिसते. जव (बार्ली), गहू, मूग, मसूर, तूर, उडीद, हरभरा, कुळीथ, वाटाणा, राळे, नाचणी अशी अशी खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिके इथे घेतली जात असत असे पुरावे सांगतात. इनामगाव शिरूरच्या जवळ आहे. दख्खनच्या अर्धदुष्काळी पट्ट्याच्या अगदी मध्यभागी. वर्षात जेमतेम ५०० मिमि पाऊस पडतो. तोही बेभरवशी. राजस्थानमधून मिळालेले पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला असे सांगतात की त्याकाळी पश्चिम भारतात थोडा जास्त पाऊस पडत असे. पाऊसपाणी नियमित असे. अशा अनुकूल पाऊसमानामुळेच या ताम्रपाषाणयुगीन वसाहती दख्खनच्या पठारावर सर्वत्र स्थिरावू शकल्या असे संशोधकांचे अनुमान आहे. प्राचीन काळापासून नदीच्या वळणावर गावं वसवली जातात कारण अशा ठिकाणी सहसा डोह तयार होतो आणि उन्हाळ्यात इतर पाणी आटलं तरी डोह मात्र गरजेपुरतं पाणी साठवून ठेवतो. इनामगाव वसवायच्या मागेही तिथली काळी सुपीक जमीन आणि नदीचं वाकण हेच महत्वाचं ठरलेलं असणार. मात्र इतक्या मोठ्या गावाला अर्धदुष्काळी हवामानात बेतास बात पाऊसपाण्यात तगून राहायचे असेल तर नैसर्गिक संसाधने व त्यांचे स्रोत यांचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागते. विशेषतः भक्कम पाठिंबा देऊ शकणारी शहरे आणि महाप्रादेशिक शासनयंत्रणा अस्तित्वातच नसताना. अशा अर्धदुष्काळी प्रदेशांत राहणार्या प्राचीन समाजांचा अभ्यास करणार्या संशोधकांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुविहित शासनयंत्रणेचा अभाव असताना आदिम लोकसमूह संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी विविध प्रकारची सांस्कृतिक धोरणे अवलंबतात. त्यात प्रामुख्याने उपजीविकेच्या मार्गांचे वैविध्य, साठवणूक, भटकंती (म्हणजे काही काळ दुसरी कडे जाऊन तिथली संसाधने वापरायची, एकाच ठिकाणच्या संसाधनांवर सतत ताण पडत नाही) आणि अन्य लोकसमूहांशी देवाणघेवाण यांचा समावेश होतो. इनामगावच्या पुराव्याकडे बघता हे चारही मार्ग इथल्या गावकर्यांनी वर्षानुवर्षे चोखाळले होते हे उघड आहे. विविध समकालीन लोकसमूहांशी देवाणघेवाणीचे संपर्क आणि उपजीविकेचे वैविध्य वरती नमूद केलेच आहे. त्या शिवाय धान्याच्या साठवणुकीसाठी मोठाल्या कणग्या, रांजण घरोघरी वापरले जात. एवढेच नव्हे तर गावाचे मिळून सार्वजनिक धान्याचे कोठारही होते आणि गावचा प्रमुख बहुदा त्याची निगराणी करत असे असेही उत्खनित पुराव्यांवरून दिसून आले आहे. शिवाय इनामगावचे काही गावकरी नियमितपणे तिथून ३२ किमी दूर असलेल्या वाळकी गावानजिक असलेल्या अतिशय सुपीक अशा जमिनीच्या पट्ट्यावर शेती करायला जात व हंगामी वस्ती करून राहात हेही वाळकी येथील उत्खननातून सिद्ध झालेले आहे.
हे सगळे खरे असले, आणि इनामगाव अर्धदुष्काळी पट्ट्यातील अगदी 'क्लासिक' असे आदिम गावाचे उदाहरण म्हणून ढळढळीत दिसत असले तरीही या सगळ्या पुराव्यांमध्ये एक थोडा विसंगत पुरावा मिळत होता. तो म्हणजे गहू. इनामगावच्या उत्खननात तांदूळ आणि वालही मिळाले होते. पण अगदीच थोडक्या प्रमाणात. त्यामुळे ते बाहेरून, जास्त पावसाच्या प्रदेशात असलेल्या गावांतून आयात केले गेले असणार, असा अंदाज सहजच बांधता येत होता. पूर्व-जोर्वे काळात गहू मात्र इथेच पिकवले जात असणार असे पुरावा सांगत होता. गहू हे रब्बी पीक आणि त्याला भरपूर पाणी लागतं, सिंचनाची व्यवस्था लागते. दख्खनमध्ये गहू होतो, पण या शिरूर-दौंडच्या पट्ट्यात कधीच नाही. तिकडे कोपरगाव परिसरात (जिथून दायमाबाद हे ताम्रपाषणयुगीन स्थळ अगदीच जवळ आहे) उत्तम काळी माती, भरपूर पाऊस म्हणून पारंपरिकरीत्या खपली, बक्षी गहू वगैरे होत असे कलोनियल रेकॉर्ड्स आपल्याला सांगतात. पण इनामगावच्या आसपास मात्र कधीच गहू झाल्याचं ऐकिवात नाही. मग इथे गहू कसा काय होत होता? पाण्याची साठवणूक किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन याविषयी ताम्रपाषाणयुगीन वसाहतींमधून जवळजवळ काहीच पुरावा तोपर्यंत उपलब्ध नव्हता. रोजच्या वापराचे पाणी साठवण्यासाठी असलेले मोठे मोठे रांजण - जे अजूनही खेडेगावांमध्ये वापरले जातात - अनेको मिळाले होते पण त्याचा वापर हा शेतीसाठी निश्चितच होत नसणार. बरं, लोहतंत्रज्ञान अवगत नसल्याने जलसंधारण करण्यासाठी विहिरी अस्तित्वात नव्हत्या हेही उघड आहे. काळा फत्तर पहारीशिवाय कसा फोडणार? अशा विहिरी सिंधू संस्कृतीत मिळाल्या आहेत, पण तो दगडाशिवायचा नदीच्या गाळाचा मऊ मातीच प्रदेश! शिवाय दख्खनमध्ये इतक्या आधी नदीवर बांध बांधल्याचे अवशेष/पुरावे अजूनतरी उघडकीला आलेले नाहीत. तेव्हा तिथे होणारे गव्हाचे पीक हे काही काळ तरी उत्खनकांना पडलेले कोडेच होते. ते उलगडले पुढच्या काही वर्षांमधे मिळालेल्या रोचक पुराव्यांनी.
गावाच्या बाहेर काही अंतरावर दगडांचे ढिगारे उत्खनकांनी बघितले होते, ते नक्की कशाचे आहेत ते बघायला त्यांनी तिथे पद्धतशीर चाचणी उत्खनन केले. त्यातून लक्षात आले की ते गावाभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आहेत. तब्बल २४० मीटर म्हणजेच जवळपास ८०० फूट लांबीची आणि दहा फूट जाडीची ती भिंत होती. एवढेच नव्हे तर या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला जवळपास समांतर असे एक ओढ्याचे/नाल्याचे पात्र असावे असा पुरावा मिळत होता. गावपरिसराच्या सम्यक भूगोलाचा विचार करताना दिसून आले की लांब गावाच्या पूर्वेला नदी आणि उत्तरेला एक छोटा नाला आहे. आणि हे पात्र त्या उत्तरेच्या नाल्याला मिळत असणार. तसेच हे नैसर्गिक जलौघाचे पात्र नाही. एकुणात पुरावा दर्शवतो की हा मुद्दाम खणलेला कालवा आहे. जवळजवळ २८ ते ३० फूट रुंद आणि साडेतीनशे फुटापेक्षा लांब असा तो कालवा होता. शिवाय त्याचा मध्यभाग आणखी खोलगट केलेला होता. अभ्यासकांच्या मते या कालव्याची किमान संधारण क्षमता सुमारे ५४००० घनफूट पाणी साठवणुकीची होती. घोडनदीला दरवर्षी येणारा पूर बघता उत्खनकांनी असे अनुमान केले आहे की दरवर्षीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी तो कालवा खोदून पुराचे अतिरिक्त पाणी त्यात वळवले जात असणार. आणि म्हणूनच कालवा आणि गावाच्या मध्ये दगडी भिंत बांधली गेली. या कालव्याने दोन उद्दिष्टे साध्य होत होती. एक म्हणजे पुराच्या अतिरिक्त लोंढ्याला वाट देऊन गावाच्या संरक्षणाला हातभार लावणे आणि दुसरे म्हणजे थोड्या खोलगट परिसरात असल्याने हे पावसाळ्यात जमलेले पाणी त्यानंतर काही महिने तिथे साठून राहात असणार. साहजिकच विहिरीशिवायची भरवशाची पाण्याची साठवणूक म्हणून या कालव्याचा उपयोग गावकरी करत असणार. कालवा आणि भिंतीमध्ये मिळालेल्या खापरांच्या आधारे याचा काळ पूर्व-जोर्वे कालखंड (इ.स.पू. १४००-१०००) असा निश्चित करण्यात आला. या काळात पाऊसमान सर्वात जास्त चांगले होते असे पुरापर्यावरणीय पुरावे सांगतात. तेव्हा उत्तम पाऊसमान आणि कालव्याचे पाणी याच्याच मदतीने इनामगावच्या शिवारांमध्ये गव्हाची लागवड होत असणार हे उघड आहे. तलाव, विहिरी, कुंडे इत्यादि गावपातळीवरील जलव्यवस्थापनाचे मार्ग या गावांना लोहतंत्रज्ञानाच्या अभावी शक्य नव्हते. नागरी सिंधू संस्कृती सोडता तत्कालिन कुठल्याच समाजात ही जलसंधारण तंत्रे आढळत नाहीत. गुजरातेत साबरमतीच्या खोर्यातील तिंबर्वा, धाटवा, जोखा अशी काही ताम्रपाषाणयुगीन गावे आसपास असलेल्या खोलगट घळींमध्ये साठलेले पाणी वापरत असल्याचे अनुमान संशोधकांनी मांडले आहे. परंतु ते पूर्णपणे नैसर्गिक असे हंगामी जलस्रोत आहेत. त्या दृष्टीने इनामगावचा कालवा हे अतिशय दुर्मिळ, कदाचित एकुलते एक, असे आद्य शेतकरी समूहांच्या जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरते.
उत्खनन :-
जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे जरी कवींनी म्हटले असले तरी ऐतिहासिक वास्तु व स्फूर्तिस्थाने यांची जपणूक करणे हे राष्ट्राच्या सांस्कृतिक उत्कर्षाचे एक प्रमुख अंग असते. सांस्कृतिक संघर्षामुळे अथवा जलप्रलयसदृश नैसर्गिक आपत्तींमुळे लोकजीवन उद्वस्त झाल्याचे आपण वाचतो. परंतु भूमाता त्याच्या खुणा साक्षेपाने आपल्या पोटात जपून ठेवते याची आपल्याला तेवढीशी जाणीवहि नसते. तिचे मनोगत जाणण्याचे लाघव उत्खननशास्त्राला आहे. सिंधुसंस्कृतीचे दालन जगाला उघडून दाखवून मोठी क्रांति केली. या संस्कृतीचा शोध उत्खननतंत्राचा अवलंब करून लागला. या तंत्रशुद्ध शास्त्राचा अवलंब करून भारतात विविध ठिकाण उत्खनने झाली. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रात नेवासे, नासिक, कोल्हापूर दायमाबाद, प्रकाशे, जोर्वे इत्यादि ठिकाणी झालेल्या उत्खननातून सापडलेल्या अवशेषांवरून अश्मयुगापासून तो तहत मुसलमानी काळापर्यंत लोकजीवन कसे होते याचे मूर्तिमंत चित्र उभे राहीले. अश्मयुगातील मानवी जीवनाचा अभ्यास करण्यास तत्कालीन दगडी हत्यारे हे एकमेव साधन उपलब्ध असते. परंतु ताम्रपाषाणयुगानंतर माणसाने बनविलेली घरेदारे, भांडीकुंडी, अलंकार, दफन पद्धति, धान्य या गोष्टी उपलब्ध होतात. या सर्वांतून त्या त्या काळाचे सांस्कृतिक चित्र निर्माण होते. साध्या खापराच्या तुकड्यांतून मानवी कर्तृत्त्वाचा कसा साक्षात्कार होतो हे बघण्यासारखे आहे. कुंभार मातीची भांडी करताना धान्याचा भुसा मिसळतो. या जळालेल्या अवशेषांवरून तत्कालीन धान्याचा मागोवा लागतो. खापरावरील चित्रविचित्र नक्षीवरून तत्कालीन समाजाची कलाविषयक माहिती लागते. दायमाबाद येथे सांपडलेल्या माठावर महाराष्ट्राच्या प्राथमिक चित्रकलेचा पुरावा सापडतो. त्या माठावर एक मानवी आकृति आहे. ती आपल्याकडे मोर व हरणे आकृष्ट करीत असल्याचा व वाघासारखे प्राणी दूर जात असल्याचा देखावा आहे.
खापराप्रमाणे तत्कालीन वास्तू, उत्खनित सांगाडे, नाणी, अलंकार व असे अनेकविध पुरावे सांस्कृतिक मूल्यमापन करताना उपयोगी पडतात. उत्खनित वास्तूवरून नगररचना, वास्तूबद्दलचे संकेत यावर चांगला प्रकाश पडतो. उत्खनित सांगाड्यावरून वांशिक साधर्म्याचा आणि मानवी स्थलांतराचा अंदाज मानववंश शास्त्रज्ञाला घेता येतो. फुलपाखरू, कासव, बेडूक, मगर यांच्या आकृतीचे मणी उत्खननात सापडले आहेत. यामुळे प्राचीन काळात लोकजीवन कसे होते ते चांगले समजते. प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी हत्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे. एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. पुण्यापासून १०० किलोमीटर व शिरूरपासून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेले इनामगाव हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे. घोड नदीतीरावर असलेले हे दुष्काळी गाव आहे. इ.स. १९६७ मध्ये ही इनामगावची मानवी संस्कृती गावकऱ्यांच्या हाती लागली. त्यातूनच पुढे १९६७ ते १९८२ अशी सलग १५ वर्षे पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या टेकडयांचे उत्खनन करून संशोधन झाले. हे गाव पुणे शहराच्या पूर्वेस सुमारे ८९ किलोमीटर (५५ मैल) अंतरावर आहे . घोड नदीच्या खालच्या भागात वसलेल्या या प्रदेशात क्रेटेशियस-इओसीन डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आढळते. सुरुवातीच्या आणि नंतरच्या जोर्वे संस्कृतीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चॅल्कोलिथिक वस्तीचे उत्खनन करण्यात आले . इनामगाव येथे चॅल्कोलिथिकचे ३ टप्पे आढळतात. हे उत्खनन त्याच्या विस्तृत आणि पद्धतशीर प्रक्रियेमुळे भारताच्या पुरातत्व इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. उत्खननातून अनेक सांस्कृतिक टप्पे उघड झाले ज्यात उशीरा जोर्वे संस्कृती, सुरुवातीचा जोर्वे संस्कृती आणि मालवा संस्कृती यांचा समावेश आहे. पुरातत्वशास्त्रातील निष्कर्ष डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय यासारख्या विविध संग्रहालयांमध्ये उपलब्ध आहेत
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे
इनामगाव येथील उत्खनन झालेले हे स्थळ मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. इनामगाव या स्थळाचे वैशिष्ट्य हे आहे की ऐतिहासिक कालखंड आणि त्या आधीचा,पूर्व–ऐतिहासिक कालातील सिंधू–सरस्वती संस्कृतीचा कालखंड,या दोन्हीना जोडणार्या कालात (bridges the pre-historic and historic periods), इनामगाव उत्खनन स्थळ, हे सातत्याने एक मानवी वसतीस्थान राहिलेले आहे. दख्ख:नच्या पठारावर वाहणार्या भीमा या कृष्णेच्या प्रमुख उपनदीला, घोड ही नदी, दौंड गावाजवळ येऊन मिळते. या घोड नदीच्या काठावर आणि पुण्यापासून सुमारे १०० किमी अंतरावर, ‘इनामगाव‘ या नावाचे एक गाव वसलेले आहे. या इनामगावापासून सुमारे ३ मैल अंतरावर असलेल्या साधारण ६५ एकर (५०० X ५०० m) एवढ्या पसार्याच्या अर्धवर्तुळाकार आवारात, मातीच्या ५ छोटेखानी टेकड्या किंवा उंचवटे दृष्टीस पडतात. ५ उंचवट्याचाहा परिसर, पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा आहे. इनामगाव येथे सन १९६८ ते १९८३ च्या दरम्यान घोड नदीतीरावर असलेल्या पाच टेकड्यांवर उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन डॉ. ह. धो. सांकलीचा, डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. झै. अन्सारी या शास्त्रज्ञांच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आले होते. इनामगावच्या उत्तरेस सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर सुमारे ५५० मीटर (१,८०० फूट) बाय ४३० मीटर (१,४१० फूट) लांबीचे एक प्राचीन स्थळ आहे. या ठिकाणी पाच ढिगारे आहेत. सर्वात मोठ्या ढिगार्याला 'इनामगाव पहिला' असे म्हणतात आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे आणि त्याच्या पुरातत्वीय शोधांचा अभ्यास करण्यात आला आहे. हे ठिकाण ३८००-३२०० बीपी (कॅलिब्रेटेड) किंवा १८००-१२०० बीपी दरम्यान वसलेले होते. या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन मानवी संस्कृतीचे अवशेष सापडले होते. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत याच ठिकाणी होती. या उत्खननात हत्ती, रानटी बैल, रानमेंढी, शेळी आदींसह सस्तन प्राण्यांचे जीवाष्म आढळले होते. आद्य शेतकऱ्यांची घरे, हत्यारे यामध्ये (तासण्या, भोक पडण्याचे हत्यार, छिलके, टोकदार हत्यारे), वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी (लाल किंवा लाल-काळी), शेतीची अवजारे आदी आढळून आली होती. हा काळ तब्बल ४० ते ५० हजार वर्षांपूर्वीचा आहे.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील मानवी वस्तीचे तीन कालखंडात विभाजन केलेले आहे. यापैकी पहिल्या कालखंडाला ((१६०० -१४०० इ.स.पूर्व) ‘माळवा संस्कृती‘, १४००-१००० इ.स.पूर्व या कालखंडाला ‘पूर्व जोरवे संस्कृती‘ आणि १०००- ७०० इ.स.पूर्व या कालखंडाला ‘उत्तर जोरवे संस्कृती‘ या नावाने ते ओळखतात. इनामगाव मध्ये यानंतर म्हणजे १४००-१००० इ.स.पूर्व मध्ये किंवा पूर्व जोरवे संस्कृती कालखंडात स्थायिक झालेले लोक, प्रवरा–गोदावरी खोर्यांतून आलेले किंवा स्थानिक लोक होते. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील उत्खननावरून काढलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही इनामगावमध्ये बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या.
पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ उत्खनन करत असलेल्या बहुसंख्य स्थानांवर भूतकाळातील एका पाठोपाठ एक होऊन गेलेल्या सांस्कृतिक कालांचे अवशेष हे बहुधा उभ्या पातळीमध्ये, एकाच्या डोक्यावर एक या पद्धतीने साठत गेलेले असतात. त्यामुळे जितके खोल खणत जावे तितके आपण जास्त जास्त गतकालात पोचत असतो. परंतु इनामगावचे वैशिष्ट्य हे आहे की येथे होऊन गेलेल्या तिन्ही संस्कृतींचे अवशेष हे एकाच पातळीवर विखुरलेले आढ्ळतात. त्यामुळे एका ठिकाणी घेतलेल्या खड्ड्यात फक्त एकाच संस्कृती कालाचे अवशेष आढळतात. अमेरिकन लोक खूप वेळा त्यांच्या म्हणजे अमेरिकन संस्कृतीला, वितळवून एकवटणार्या हंड्याची (melting pot) उपमा देत असतात. त्यांच्या मताने अमेरिकेत बाहेरून सतत येत असलेल्या नाना वंशांच्या, खंडांमधल्या आणि जातीधर्माच्या स्थलांतरितांच्या एकत्रीकरणामुळे अमेरिकेची अशी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली आहे. येणारा प्रत्येक स्थलांतरित या संस्कृतीच्या हंड्यातील उकळणार्या रसायनाला आपले खास असे वैशिष्ट्य बहाल करत त्या रसायनात वितळून जात असतो. इनामगाव येथील उत्खननावरून शास्त्रज्ञांनी काढलेला आणि वर उल्लेख केलेला निष्कर्ष बघता मला असे कुतूहल वाटते आहे की इनामगावला असेच काहीसे झाले असेल का? सिंधू–सरस्वती खोर्यांतून येणारी उत्तर भारतीय संस्कृती व या भागात आधीच स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीयांची संस्कृती या अशाच एकमेकात मिसळून गेल्या असतील का? काही कालापूर्वी CSIR या भारतीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात, दख्खनच्या पठारावर आणि दक्षिणेकडे स्थायिक झालेले लोकांनी मूलतः मलै द्वीपकल्पावरून तेथे स्थलांतर केले असावे असा अंदाज बांधलेला होता. हे लोक आणि सिंधू–सरस्वती संस्कृती मधून आलेले लोक हे इनामगाव सारख्या अनेक स्थानांवर एकत्र मिसळून गेले असतील, का त्यांनी आपापल्या संस्कृती अलग ठेवल्या असतील? गेल्या हजार पंधराशे वर्षांमध्ये रचल्या गेलेल्या काही ग्रंथांचा आधार घेतला (महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती), तर असे दिसते की वैदिक किंवा नंतर हिंदू धर्माचे पालन करत असलेला भारतीय समाज, सर्वव्यापी असणार्या एका ‘जातीव्यवस्था‘ किंवा चतुर्वर्ण या नावाने ओळखल्या जाणार्या सामाजिक बंधात संपूर्णपणे जखडून गेला होता व आहे. या जातीव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, फक्त आपल्या जातीपुरता मर्यादित ठेवणे (endogamous) हे होते किंवा आहे. मग असे जर असले तर इनामगाव सारख्या स्थानावर या जात किंवा वर्ण व्यवस्थेचे पालन होत असेल? का उत्तर भारतीय आणि दख्खनच्या पठारावरील स्थायिक लोक यांच्यात रोटीबेटीचे व्यवाहार चालू होऊन एक नवा भारतीय समाज निर्माण झाला असेल? या प्रश्नांची उत्तरे देणे कोणाला शक्य होईल असे मला तरी वाटले नव्हते, परंतु हैद्राबाद येथील CSIR-Centre for Cellular and Molecular Biology आणि Harvard Medical School या दोन संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणार्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने एकत्रपणे किंवा सहकार्याने केलेल्या एका अभ्यास उपक्रमाच्या निष्कर्षांवरून हे उत्तर देणे आता शक्य झाले आहे. प्रिया मूरजानी, कुमारसामी थांगराज, निक पॅटरसन, मार्क लिपसन, पो–रु–लोह, पेरियासामी गोविंदराज, बॉनी बेर्जर, डेव्हिड राइच आणि लालजी सिंह ( Priya Moorjani, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Mark Lipson, Po-Ru Loh, Periyasamy Govindaraj, Bonnie Berger, David Reich and Lalji Singh) या शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यास उपक्रमाचे निष्कर्ष, ‘Genetic Evidence for Recent Population Mixture in India’ या नावाने लिहिलेल्या संशोधन प्रबंधात‘American Journal of Human Genetics.‘ या मासिकात प्रसिद्ध केले आहेत. जनुकशास्त्राच्या आधाराने केलेल्या या अभ्यास उपक्रमाचा हा अहवाल हे स्पष्टपणे सांगतो: “भारतात आढळणारे बहुतेक जनुकीय गट हे दोन एकमेकापासून भिन्न असलेल्या मानवी जनसमुदायांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या जनुकीय गटाचे वंशज असल्याचे दिसते: मध्य एशिया, मध्यपूर्व, कॉकेशस पर्वत रहिवासी आणि युरोपियन यांच्या वंशमिश्रणातून आलेले “पूर्वज उत्तर भारतीय (ए एन आय)” आणि भारतीय उपखंडाबाहेरील कोणत्याही जनुक गटाशी साधर्म्य नसलेले “पूर्वज दक्षिण भारतीय (ए एस आय)” हे ते दोन भिन्न जनुकीय गट आहेत.” “ Most Indian groups descend from a mixture of two genetically divergent populations: Ancestral North Indians (ANI) related to Central Asians, Middle Easterners, Caucasians, and Europeans; and Ancestral South Indians (ASI), not closely related to any groups outside the subcontinent.” या अभ्यास प्रकल्पावर कार्य करणार्यांना असे आढळून आले की त्यांनी रक्त चाचणी केलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या जनुकीय भूतकालाचा सर्वात पूर्व संबंध, एकतर युरोप–एशिया मधून आलेला पहिला गट किंवा मूळ आफ्रिकेतून आलेला दुसरा गट यांच्याशी निर्विवादपणे जोडता येत असला तरी नंतर या दोन्ही गटांचे आपापसात रोटीबेटी व्यवहार झाल्याने एकमेकाशी जनुकीय मिश्रण होऊन जो एक नवीन एकात्मक जनुकीय गट झाल्याचे लक्षात येते त्याच्याशी सुद्धा या सर्व भारतीय व्यक्तींचा स्पष्ट जनुकीय संबंध असल्याचे सिद्ध होते. मात्र गतकालातील एका अज्ञात क्षणापासून पुढे,याच भारतीय व्यक्तींचे जनुकगट, भाषा, धर्म आणि अदिवासी समाज गट यांच्यावर आधारित असे भिन्न भिन्न गट होत जाऊन आता त्यांचे ४६३५ भिन्न जनुकीय गट तयार झाले आहेत. याचा अर्थ असा होतो की इनामगाव सारख्या अनेक मानवी वस्तींमध्ये उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यांच्यामध्ये वाढत गेलेल्या रोटीबेटी व्यवहारामुळे निर्माण झालेले भारतीय एकवटणार्या हंड्यातील उकळते जनुकीय रसायन, गतकालातील या अज्ञात क्षणापासून पुढे एकदम गोठून गेले व भारतीय समाजाचे भाषा, धर्म,जात आणि अदिवासी संस्कृती यांच्यानुसार विभाजन होत राहिले. आता प्रश्न असा उभा राहतो की हा अज्ञात क्षण गतकालात कधी आला असेल? तो इनामगावमध्ये मानवी वस्ती होती त्या कालाच्या आधी आला की नंतर? या प्रकल्पावर कार्य करणार्या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले आहे. ते म्हणतात की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय मिश्रण हे सुमारे 4200 वर्षांपूर्वी (इ.स.पूर्व 2200) किंवा उत्तर हडप्पा संस्कृतीकालात सुरू झाले. या कालापासून पुढची 2100 वर्षे म्हणजे 1900 वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.पहिले शतक) हे जनुकीय मिश्रण अबाधितपणे चालू राहिले. या सामाजिक बदलाबद्दल हा अहवाल म्हणतो: ” हा 2100 वर्षांचा काल हा एक महत्त्वाचा संक्रमणकाल होता. या कालात सिंधू संस्कृतीतील नागरीकरण विलयास गेले. गंगा खोर्यातील जनसंख्या सतत वाढत राहिली आणि भारतीय–युरोपियन भाषागट आणि वैदिक धर्म हे उदयास आले.” “It was a time of profound change, characterised by the de-urbanisation of the Indus civilisation, increasing population density in the Gangetic system, and the likely appearance of Indo-European languages and Vedic religion.” या २१०० वर्षाच्या संक्रमण कालानंतर अकस्मातपणे ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया संपूर्णपणे थांबली किंवा एकवटणारा हा हंडा गोठून गेला. या अहवालाप्रमाणे जनुकीय प्रक्रिया थांबण्याचा हा क्षण इ.स. पहिल्या शतकामध्ये आला. ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसने साधारण इ.स.पूर्व ३०० मधे लिहिलेल्या आपल्या इंडिका या ग्रंथात भारतातील जाती किंवा वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे यानंतरच्या कालात लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि लेखन काल अचूक रित्या ज्ञात नसलेल्या महाभारतात सुद्धा चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. हे सर्व ग्रंथ वर उल्लेख केलेल्या जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबण्याच्या कालाच्या २०० ते ३०० वर्षे आधी लिहिले गेले असल्याने आपल्याला एक अत्यंत रोचक असा निष्कर्ष काढणे शक्य आहे. या निष्कर्षाप्रमाणे जरी चतुर्वर्ण व्यवस्थेला अधिकृतता इ.स.पूर्वी काही शतके प्राप्त झालेली असली तरी सर्वसाधारण भारतीय समाज हा अजूनही एकसंध होता व त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार पुढे काही शतके तरी चालूच राहिले होते. ( आपण असे मानतो की मनुस्मृती या ग्रंथात चतुर्वर्ण व्यवस्थेचे नियम प्रथम लिहिले गेले. या अहवालाप्रमाणे मनुस्मृती हा ग्रंथ ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबल्याच्या किंवा इ.स. पहिले शतक या कालानंतर लिहिला गेलेला आहे.) जनुकशास्त्राचा कोणताही अभ्यासक आपल्याला सांगू शकेल की वर उल्लेख केलेला एकवटणारा जनुकीय हंडा गोठून जाणे ही बाब कोणत्याही समाजाच्या भविष्यकालाच्या दृष्टीने हितावह अशी बाब असू शकत नाही. या बाबतीत हा अहवाल म्हणतो: ” भारतातील सध्याच्या पिढीत जे अनुवंशिक आणि जनुकीय रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांचे वाढलेले प्रमाण मागच्या 1900 वर्षे सतत झालेल्या जाती अंतर्गत विवाहांमुळे (endogamous) असले पाहिजे.” “An important consequence of these results is that the high incidence of genetic and population-specific diseases that is characteristic of present-day India is likely to have increased only in the last few thousand years when groups in India started following strict endogamous marriage.” इनामगावकडे आपण परत वळूया. इनामगाव येथील मानवी वस्ती ही भिन्न असलेल्या मानवी संस्कृतीचे एकत्रीकरण करणारा एक खराखुरा ‘वितळवणारा हंडा‘ होता आणि अशा शेकडो इनामगावांच्या आधारावर एकत्रीकरण झालेली नवीन आधुनिक भारतीय संस्कृती आणि लोक उदयास आले असे म्हणणे वावगे ठरू नये. शेवटी आपल्याला माहीत असलेल्या ऐतिहासिक आणि पूर्व–ऐतिहासिक घटनांचा संबंध या अहवालाशी कसा लावता येतो ते आपण पाहूया. इ.स.पूर्व १०००० वर्षांपासून वायव्येकडून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरितांचे आगमन सतत होत आलेले आहे. या स्थलांतरितांनी आपली संस्कृती सिंधू–सरस्वती खोर्यांत स्थापन केली. ही संस्कृती इ.स.पूर्व २००० पर्यंत अबाधित राहिली. या लोकांचा दख्खनच्या पठारावर राहणार्या आणि मूलतः मलै द्वीपकल्प किंवा अंदमान–निकोबार बेटे येथून आलेल्या लोकांशी फारसा काहीच संबंध न आल्याने त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार झाले नाहीत व त्यांची संस्कृती दख्खनच्या पठारावरील लोकांपेक्षा भिन्न राहिली. या अहवालात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यामधील जनुकीय मिश्रण या कालापर्यंत झालेले आढळून येत नाही.
इनामगाव संस्कृती :-
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.
इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३ हेक्टरच्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या. गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..) इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे inm.jpg यात सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी. आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४ दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं. चूल म्हणजे काही वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा, त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्याही इंधन म्हणून यात स्वाहा होत. एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या (तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू, गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी, लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात.
इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अॅन्टेलोप काढलेलंही स्पष्ट दिसत आहे
रोजची औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्हाडी, गारगोटीचे छिलके काढून तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार व्हायची!), तांब्याच्या कुर्हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय! लोक कपडेबिपडे घालत होते की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या 'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात. भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी अॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक, लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी उत्खननांमधून मिळालेत. उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging) असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत. आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं, तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती.
शेतीसाठी वापरात आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill ( ) यांचा समावेश आहे.
पाळीव प्राण्यांमधे गाय-बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, गाढवं, कोंबड्या, डुकरं, आणि कुत्री, मांजरं यांचा पुरावा आढळतो. घोडा आढळतो पण तो अगदी शेवटच्या कालखंडात (बहुदा दक्षिण भारतातल्या लोहयुगीन लोकांच्या संपर्कामुळे). शिकार करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर, कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक, खेकडे, मासे, इ. या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच. याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे, शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो. या सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच बनवत. हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती. इनामगावच्या उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे ६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं!
आणि इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर शुद्ध रस खापराच्या मुशीत! एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते. या परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:- तांबे (राजस्थान/गुजरात); शंख (गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अॅमेझोनईट हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ. दळणवळणाची साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर! शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात.
रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र
हे झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून (इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही).
हे लोक मृतांचे दफन करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult) व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात. शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत.
बाकी त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही. पण विविध प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात. तेव्हा स्त्रीतत्त्वाची/ सुफलनाची संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल नाही. शिवाय गुजरात, राजस्थान, माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात. बैल कदाचित पुरुषतत्त्वाशी, शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा. इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली. ही निश्चितच कुठल्यातरी धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून गेला आहे. याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग एका वन्य प्राण्याचा (बहुदा बिबळ्या) अशीही एक आकृती आढळते. याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.
हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात). पाच खोल्या असलेले घर आणि घरातच दफनभूमी सापडणे, कदाचित एखाद्या प्रमुखाचे,
हे सामाजिक पदानुक्रम सूचित करते. मुलांसाठी कलश दफन आणि प्रौढांसाठी
विस्तारित किंवा पिथोस दफन यासारखे विविध प्रकारचे दफनविधी देखील त्यांच्या
रीतिरिवाजांबद्दल संकेत देतात.
त्या काळची भांडी, कालव्याद्वारे पाणी नेऊन शेती करण्याची अत्याधुनिक पध्दत, शिकारीसाठीची हत्यारे, मृत व्यक्तींना रांजणाच्या आकाराच्या भांडयात दफन करण्याची पद्धत यावरून ही संस्कृती किती प्रगत होती याचे पुरावे हाती लागले होते. तेथून पुढे देशभरातील संशोधकांच्या नजरा इनामगाव कडे वळल्या इनागावकडे अभ्यासक आणि संशोधकांची रांग लागली. याठिकाणी शोध लागलेल्या संस्कृतीचे आर्य आणि द्रविड संस्कृतीबरोबर व्यापारी संबंध आणि देवाणघेवाण होती हे ही सिद्ध झाले आहे. ही मानवी वसाहत सुमारे ३००० वर्षापूर्वीची व ताम्रपाषाणयुगीन असल्याचा निष्कर्ष निघाला. महाराष्ट्रातील आद्य शेतकन्यांची पहिली वसाहत याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. मातृपितृ देवतांच्या मूर्ती व स्वस्तिक चिन्ह त्या काळीही अस्तित्वात होते यांचा उलगडा झाला. घोड नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याकडेला असणाऱ्या मातीच्या उंच सखल टेकडया, विविध रंगी पक्ष्यांचे थवे, निसर्गरम्य परिसर हे सर्व पाहिल्यावर ही जागा मानवी वसाहतीसाठी किती योग्य होती यांचा अंदाज येतो. विविध दंतकथांनी प्रसिद्ध असलेली व अस्तित्वात असणाऱ्या कुलदेवतांचे साजरे होणारे सण, वसाहतीच्या ठिकाणी आज सापडणारे पुरातन काळातील मातीच्या भांडयांचे तुकडे पाहताना मन भारावून जाते. उत्खननात सापडलेल्या वस्तू १९८२ मध्ये लंडन येथे भारवलेल्या जागतिक प्रदर्शनात ठेवल्या होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेज, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व नगर येथील संग्रहालयात येथील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. आजही या ठिकाणी देश-विदेशातील हजारो संशोधक भेटी देऊन या ठिकाणची माहिती घेताना दिसत आहेत. 'पुरातत्त्व'च्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व - येथे शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिली कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याची पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. अस्थी कुंभात दफन करण्याच्या येथील पद्धतीमुळे यांचा द्रविड संस्कृतीशीही संबंध येतो. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्वाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हे समाजसमूह राजसत्तेने नियंत्रित नव्हते तर ज्याला मानववंशशास्त्रात चीफडम (chiefdom) म्हणतात तसे, गावप्रमुखांच्या आधिपत्याखाली सहकारी तत्वाने जगणारे समूह होते. जन्माधारित सामाजिक भेदाभेदही इथे असल्याचा पुरावा नाही. तेव्हा अशी सार्वजनिक पातळीवरची कामे ही गावप्रमुखाने केलेल्या नियोजनावर आधारित पूर्णपणे सहकारी तत्वावर पार पाडली गेली असणार हे उघड आहे. दख्खनमधील ही आद्य पाणी-पंचायत मानायला हरकत नसावी. अशा व्यवस्था कदाचित इतरही समकालीन वसाहतींमध्ये असू शकतील, परंतु आपल्याला तसे पुरावे मिळालेले नाहीत. मात्र इ.स.पू १००० पासून, उत्तर जोर्वे कालखंडापासून पाऊसमान बेभरवशी झालेले दिसून येते. दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढायला लागली. गाळ साठून आणि अपुर्या पावसाने या कालव्याचा वापर थांबलेला दिसतो. हळूहळू तो बुजून गेला. गव्हाची लागवड आता कुणी करेनासे झाले. नाचणीसारख्या कमी पाण्याच्या पिकांवर आणि काळविटांच्या शिकारीवर भर वाढायला लागला. हळूहळू शेतीचे प्रमाण कमी होऊन पशुपालनावर गाव जास्त विसंबून राहू लागले आणि मग पाण्याच्या शोधात, चराऊ कुरणांच्या शोधात गावाबाहेर पडून अर्धभटके जीवन जगायला लागले. गाव जगायला बाहेर पडलं आणि संस्कृतीचे चक्र 'उलटे' फिरून परत एकदा भटके जीवन समाजाने स्वीकारले.
हे असे समाज भारतात इतर प्रदेशातही होते. हळूहळू यांना लोहतंत्रज्ञानाचा शोध लागला आणि इ.स. पूर्व ५-६व्या शतकानंतर येणार्या शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसते. अगदी विदर्भातही असाच सांस्कृतिक कालानुक्रम आढळतो. पण दख्खनच्या पठारावर मात्र काही वेगळंच घडलं! इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला. अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल! इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे. या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले. आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले. इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची. इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढची चारपाचशे वर्षे आपल्याला दख्खनमध्ये फारशा वसाहती मिळत नाहीत. मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परत एकदा पाऊसमान सुधारते, दख्खन हजारो गावांनी, शहरांनी फुलून उठतो. सातवाहनकालीन शहरीकरणाबरोबर आता लोहतंत्रज्ञानाचाही सर्वत्र शिरकाव येथे होतो. आणि मग साहित्यात, शिलालेखांत विहिरी-तलाव-बांधबंधारे-टाकी यांचे उल्लेख आढळायला लागतात. बौद्ध लेण्यांमध्ये पुण्य कमवायला म्हणून अनेकांनी दान देऊन दगडात कोरून घेतलेल्या पोढि किंवा टाकी दिसू लागतात. आपण ज्याला पारंपरिक जलसंधारणाचे मार्ग म्हणतो त्याचा उदय पहिल्यांदा या काळात दिसतो. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो. मात्र इनामगावची पांढर ओसाडच राहिली. परत तिथे कधीच माणूस वसला नाही. तिथले गावकरी कुठे पांगले, भटकत भटकत कुठे गेले, सातवाहनकाळात त्यांचे वंशज समाजात कसे मिसळले हे आजही आपल्यासाठी अज्ञातच आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी केलेला दख्खनचा पहिल्या पाणी-पंचायतीचा प्रयोग विस्मृतीच्या नदीत विलीन झाला. आजही इनामगावच्या पांढरीवर उभं राहिलं की अर्धदुष्काळी - गाव सोडून जगायला बाहेर पडायला लावणारा - दख्खन म्हणजे काय हे आसपासच्या परिसरावरून नीटच उमजतं. पण त्याचवेळी आपल्या पायाखाली बुजलेला कालवा असतो. प्रगत तंत्राची उपलब्धता नसतानाही चिवटपणे माणसांनी पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेऊन जीवनाचा ओघ वाहता ठेवण्याच्या अदम्य धडपडीचे प्रतीक! या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे. भीमेच्या खोर्यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे
सध्यस्थिती :-
गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिप्राचीन ठिकाण, येथील संस्कृती, उत्खननात सापडलेली भांडी यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी ग्रामस्थ, अभ्यासक, संशोधक यांची मागणी होती. या साठी १९८२ सालापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु होते. सन १९८४ मध्ये या ठिकाणाला राज्य संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळाला. पुढे देश विदेशातील हजारो संशोधक या ठिकाणाला भेट देऊन गेले. इनामगाव येथील उत्खननातील अवशेष व वस्तू डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, अहमदनगर व भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या उत्खननातील वस्तू व अवशेषांचा १९८२ साली ग्रेट ब्रिटन येथे जागतिक प्रदर्शनामध्ये सहभाग होता.
खानदेशातील मानवी वसाहत :-
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात ठिकाणी झालेल्या अभ्यासातील रेडीओ कार्बन कालमापन पध्दतीने काळ इसवीसन पुर्व ४०,०००-१०'००० एवढा मोठा आहे. या साठी पाण्यातील शिंपले, अर्ध कार्बनाईज झालेले लाकुड आणि हाडे हे मटेरीयल वापरलेले आहेत. थर्मोल्युसन्स आणि युरेनियम/ थोरीयम पध्दतीने काढलेल्या काळाचा तारखा राजस्थान येथील मध्य पुराश्मयुग १,५०,००० ते १००,००० एवढा येतो. महाराष्ट्रातील चिरकीनाला प्रवरा अहमदनगर जिल्हा, वाडोलीवाघोली हे गोदावरी नदीच्या खोऱ्यातील औरंगाबाद जिल्हा, पाटणे आडनाला जळगाव जिल्ह्यातील, महाराष्ट्रात प्रातिनिधिक समजले जाणारे म्हणजे नेवासा आणि पाटणे ही दोन स्थळे आहेत. गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे १९५२ व ५७ मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत. पुरातत्वेत्यांनी गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही अवशेष सापडले आहेत. कार्बन २४ या कालमापन पद्धतीच्या सहाय्याने पूर्व पुराश्मयुगाचा भारतातील काळ निश्चितपणे आज पासून एक लक्ष वर्ष एवढा होता, काही ठिकाणी तो १४ लक्ष तसेच त्याच्याही मागे जाण्याची सुद्धा शक्यता आहे. भुगर्भ शास्त्राच्या परिभाषेत तो पूर्व ते मध्य प्लायस्टोसीन युगा इतका आहे तर मध्य पुराश्मयुगाचा काळ हा मध्यप्लायस्टोसीन ते उत्तर प्लायस्टोसीन म्हणजे आज पासून एक लाख वर्ष पूर्व ते ४० हजार वर्ष पूर्व एवढा होतो. या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे बदल घडून आले असे भूगर्भ शास्त्रज्ञ मानतात. पृथ्वी दुसऱ्या अंतरहिमाचा अनुभव घेत होती असे दिसते. पर्यावरणात झालेल्या या फरकामुळे मात्र प्रत्यक्षात जीवसृष्टी आणि हवामान यात फरक पडलेला दिसत नाही.कदाचित तेव्हापासून मानवाच्या मेंदूमध्ये अधिक प्रगल्भता निर्माण झाली असल्यामुळे त्यांची हत्यारे प्रगत तंत्राची आणि जास्त कौशल्यपूर्ण अशी होती. मोठ्या आकाराच्या हात कुऱ्हाड किंवा त्यांच्या अभावी मध्यपुराश्मयुगात मानवाने कठीण दगडाचा जास्त सुबक तंत्रान घडवलेल्या तासण्या, बाणांची टोके, गिरमिटे, पाती, चाकु इत्यादींचा अंतर्भाव असलेले प्रभावी हत्यारे तयार केली. या हत्यारांचे वैशिष्ट्य असे होते की लहान-लहान घडवलेल्या चिपा एका मोठ्या लाकडाच्या अथवा हाडाच्या खोबणीत बसवून त्यापासून त्याचे एक मोठे हत्यार तयार केलेले दिसते. दुसरे असे की अवजडपणा जाऊन आकारात सुटसुटीतपणा आल्याने हत्यारांचा पल्ला वाढला आणि त्याच्यात अचूकता आली आणि ती अधिक परिणामकारक रित्या शिकार करण्यासाठी वापरता आली. जनावरांच्या कळपात पिटाळत नेऊन उंच ठिकाणावरून खाली हाकलत पाडून मारण्याच्या शिकारीच्या तंत्राबरोबरच परिणामकारक रित्या प्राणी किंवा पक्षी यांचे यशस्वी शिकारी तंत्र मानवाने आत्मसात केले, या दगडाच्या उपयोग बनवण्यासाठी उपयोग झाला. पुरातत्त्वज्ञ एस ए. साळी यांच्यामते मध्यपुराश्मयुगाचे सुरुवातीच्या काळात जे काही भूगर्भातील प्रचंड स्थित्यंतरे ज्याला टेक्टनिक मोवहमेंट्स म्हटले जाते. त्याचे परिणाम तापी खोऱ्यात ही झाले. आणि त्याच काळात पाटणाच्या दक्षिणेला अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी एक खोलगट भाग तयार झाला. अनेक दृष्टीने सुरक्षितता लाभलेल्या या भागात चाळीस हजार वर्षापासून म्हणजे मध्य पुराश्म काळात च्या शेवटच्या काळापासून ते उत्तर पुराश्म काळात या भागात मानव वस्ती करून राहू लागला. या युगातील मानवी वसाहतींचे पुरावे दर्शवणारे पाटणे हे एक स्थान आहे. या काळातील पाषाण आयुधे ही पाटणे येथे सापडली आहेत. मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग आणि मध्याश्मयुगात म्हणजे काळात या भागात महत्त्व आहे. या उत्खनन स्थानामध्ये पाटणे विशेष महत्वाचे आहे. पाटणे अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी तीन बाजूंनी डोंगर कडा असलेल्या वर्तुळाकार दीर्घ नाट्यशाळे सारख्या खोऱ्यात आहे. या भागातील भुस्तरात कंकर म्हणजे दगड गोटे, गाळ, वाळू व मातीचा अंदाजे १० ते २० मीटर थर आहे. या थरात एस.ए. साळी यांनी दोन वेळा उत्खनन केले. त्यात त्यांना भुविज्ञानविषयक तेरा थर आढळले. त्यात सर्वात खालचा थर हा मध्य पुराश्म युगातील असून त्यातील आठ थर उत्तर पुराश्म युगातील आहे. सर्वात वरचे चार थर हे मध्याश्मयुगातील असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर पुराश्म युगातील आठ थरांची जाडी एकूण ५.५ मीटर असून क्रमांक पाच आणि सात वर मानवनिर्मित कला वस्तूंची समृद्ध आहेत आणि त्यांच्यात अनुक्रमे ११,७८८ आणि १२३०३ एवढे विविध नमुने आढळले आहेत, तसेच उत्तर पुराश्म युगातील शहामृगाच्या अंड्यांची शंभराहून अधिक नमुने सापडले आहेत. त्यातील तीन नमुने उत्तर पुराश्म युगातील असून अंड्याच्या कवचावर जाळीची नक्षी दिसून येते. या ठिकाणी शहामृगाच्या अंड्यापासून बनवलेले तीन चपटे मणी आणि नदीच्या मुखाजवळील प्रदेशात शंखा पासून बनवलेल्या मण्यांचेही नमुने सापडले आहेत. ते उत्तर पुराश्म युगातील आहे, या काळातील मानवी कलावंत एकत्रित वसाहत करून रहात असल्याचा सर्वात मोठा आधीचा पुरावा मानला जातो. मध्य पुराश्म युगातील अणुकुचीदार हत्यारांचा वापर मानवाच्या सुरुवातीच्या अवस्था दाखवतो. उत्तर पुराश्म युगातील काळात मानव जा स्वर दगडापासून हत्यारे बनवी तर याच काळातील नंतरच्या काळात मानव म्हणजे पांढरा चकचकीत दगड किंवा गार यापासून हत्यारे बनू लागला. नंतरची हत्यारे त्याच्या अर्धचंद्राकार, विषम, चतुर्भुज व त्रिकोणी आकारावरून ओळखता येतात. या भागात मध्य पुराश्मयुगा पासून ते मध्याश्मयुग म्हणजेच मेझोलिथिक काळा पर्यंतचे भूस्तर विज्ञान विषयक मानवी अवशेषांचे स्पष्ट पुरावे आढळून आल्याने पाटणे स्थानास असाधारण महत्त्व प्राप्त झाले. मध्य पुराश्म व उत्तर पुराश्मयुगामधील अवशेषांप्रमाणेच त्यानंतर येणारी अवस्था म्हणजे मध्याश्म युगातील जे मेझोलीथिक कल्चर म्हटले जाते,त्याचेही पुरावे पाटणे येथे मिळाले आहे. मध्याश्मयुगाचेही तीन कालखंड मानले जातात. असे पाच कालखंड साळी यांनी पाटणेच्या संदर्भात मांडले आहे. अर्थातच हे उत्तर पुराश्मकाळानंतरचे होय. पहिला कालखंड हा उत्तर पुराश्मकाळानंतरच्या काळात यात विविध प्रकारच्या पाती आणि विविध टोकांची अश्मयुगीन हत्यारे सापडतात. दुसरा कालखंडात बरेच बदल दिसून येतात, यात कोळशांचे बारीक तुकडे आणि भाजलेल्या मातीचे पुरावे दिसतात तर शेकोटी आणि स्तंभछिद्रांचे अस्तित्व दिसते. वाऱ्याने उडून आलेल्या मातीतील निक्षेपात भुस्तरावरील भाजक्या विटांसारखे पट्टेही दिसतात. तिसऱ्या कालखंडात मध्याश्मयुगातील तीनही कालखंड पाटणे येथे दिसतात. एकंदर आद्य पुराश्मयुग इसवी सन पूर्व दिड लाख वर्षे ते एक लाख वर्षांपूर्वी, मध्याश्म पुराश्मयुग इसवी सन पूर्व एक लाख ते तीस हजार वर्षे आणि उत्तर पुराश्मयुगात इसवी सनपूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष, मध्याश्मयुग इसवी सन पूर्व दहा हजार ते चार हजार वर्षे आणि नवाश्मयुग इसवी सन पूर्व चार हजार ते दोन हजार सातशे वर्षे अशा या पाच अवस्था आहेत. पाटणे भागात उत्तर पुराश्म युगातील म्हणजे तीस हजार वर्षापूर्वी मानवी वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत म्हणूनच पुरातत्त्वज्ञ एस.ए. साळी यांच्या मते तीस हजार वर्षाच्या काळात हवामानात विषयक महत्त्वाचे बदल घडून आले नसले तरी परिस्थितीत निश्चित बदल होत गेले आणि नदीला त्यांनी वाहून आणलेला गाळ पसरून मैदानी भाग तयार झाला. गवत आणि वनस्पती उगवल्या, हत्यारे तयार करण्यासाठी गारांचे दगड त्या खडकात मुबलक उपलब्ध होते. नदी नाल्यात काही ठिकाणी डोह निर्माण झाले. मैदानी प्रदेशात गवताळ भागात शहामृग तसेच मोरासारखे मोठे पक्षी व घोडे यांसारखे प्राणी राहत. अशा परिस्थितीत सातमाळा डोंगराच्या पायथ्याशी मानवाने आपले गावठाण स्थापन केले, या पाच अवस्था वरून हळूहळू कसा विकास होत गेला हे लक्षात येते.
विदर्भातील अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृती :-
नागपूर जिल्ह्यात अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीचे महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बेला गावाजवळ असलेल्या कोहळा गावाच्या शेजारी अवशेष आढळले आहेत. महापाषाण संस्कृतीची शंभरावर शिलावर्तुळ प्रकारचे दफनस्मारके, आणि प्राचीन वसाहत आढळून आली आहे.
शिळावर्तुळ ,शिळास्तम्भ,शिळाप्रकोष्ठ, दगडांची रास, शवपेटी अशी या संस्कृतीची विविध प्रकारची दफन स्थाने पूर्व विदर्भात वर्धा आणि वैनगंगा नदीच्या खोऱ्यात मोठ्या संख्येने आढळून आलेली आहेत.महापाषाण संस्कृतीचे लोक हे विदर्भाचे आद्यनिवासी होत, त्यांनीच शेतीची सुरुवात विदर्भात सर्वप्रथम केली. या लोकांना लोखंडाचा उपयोग माहित होता, एवढेच नव्हे तर लोहमृतिकेपासून लोह गाळण्याची कलाही त्यांना अवगत होती. हे यावरुन दिसून येते आहे.
चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास!
महाराष्ट्रातील सर्वांत आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती सुमारे चार हजार वर्षांपूर्वी उदयाला आल्या. फक्त तांबे हा धातू माहीत असलेली आणि शेती, पशुपालन, शिकार यावर अवलंबून असणारी छोटी गावे खानदेश ते कर्नाटक सीमेपर्यंत सर्वत्र आढळतात. तांबड्या गेरू रंगावर काळी नक्षी असलेली किंवा काळी-लाल/करडी अशी दुरंगी मातीची भांडी हे लोक वापरत असत. त्या काळी लेखनकला अस्तित्वात नसल्याने केवळ त्यांनी वापरलेल्या मातीच्या मडक्यांचे तुकडे हाच त्यांच्या वसाहतींचा एकमेव पुरावा असतो. सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी ही गावे अचानक उजाड झालेली आढळतात. प्रतिकूल पर्यावरण आणि वारंवार पडणारे दुष्काळ हे यामागचे कारण असावे, असे मानले जाते. भीमेच्या खोऱ्यातील इनामगाव या एकमेव उत्खननातून मिळालेल्या माहितीशिवाय उत्तरजोर्वे या ताम्रपाषाणयुगीन अंतकाळाविषयी फारशी काहीच ठोस माहिती नाही. वैशिष्ट्यपूर्ण मडकी वापरणाऱ्या उत्तरजोर्वे काळातील गावांचा पुरावाही भीमा खोऱ्याबाहेर आजवर अद्याप मिळाला नव्हता. मात्र, आता अतिशय सुपीक आणि उत्तम पाऊस असणाऱ्या कृष्णेच्या खोऱ्यातही अशा खापरांचा पुरावा मिळाल्याने या वसाहती केवळ अर्धदुष्काळी भीमेच्या खोऱ्यापुरत्या मर्यादित नव्हत्या; तर इतर प्रदेशांतही ताम्रपाषाण युगातल्या शेवटच्या कालखंडात या वसाहती होत्या, हे दिसून आले आहे. त्यामुळे या कालखंडाचा परत साकल्याने फेरविचार करण्याची गरज आहे, तसेच महाराष्ट्रातील इतर प्रदेशांतही सर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे, हे या संशोधनातून अधोरेखित झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पुरातत्त्वीय संशोधनामुळे या प्रदेशाचा इतिहास सुमारे चार हजार वर्षे जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याच्या वरदा खळदकर, मंजिरी भालेराव, अंबरीश खरे, आनंद कानिटकर व कल्पना रायरीकर या संशोधकांनी चिकुर्डे व आसपासच्या परिसरात पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून हे निष्कर्ष काढले आहेत. वारणा- मोरणेच्या संगमाजवळील चिकुर्डे हे स्थळ १९०७ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनी वाचन केलेल्या चिकुर्डे ताम्रपटामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. ताम्रपटातील स्थळवर्णने व इतर बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले. चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द, थानापुडे, मांगले व करंजवडे या गावांचा यात समावेश होता. या अभ्यासाअंती असे लक्षात आले, की या सर्व गावांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत म्हणजे दोन हजार वर्षे मागे जातोच; परंतु चिकुर्डे, देवर्डे व मांगले या गावांचा इतिहास त्याही आधी म्हणजे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपर्यंत मागे जातो. या तीनही गावांमधून डेक्कन चाल्कोलिथिक म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळातील खापरे मिळाली आहेत. मांगले येथील पुरावा डेक्कन चाल्कोलिथिकच्या सुरवातीच्या काळातील, माळवा कालखंडातील आहे. असाच पुरावा पूर्वी कऱ्हाड येथील भारत इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या उत्खननातही नोंदवला गेला होता. मात्र, चिकुर्डे व देवर्डे येथील खापरे उत्तरजोर्वे कालखंडाची म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळाच्या शेवटच्या कालखंडातील आहेत. चिकुर्डे, देवर्डे व मांगले येथील पुरातत्त्वीय अवशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवे वळण देणारा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे. तसेच, ही तीनही गावे तीन ते चार हजार वर्षांपासून अस्तित्वात असून, या प्रदेशातील ती सर्वांत जुनी गावे आहेत. या गावात असलेल्या या प्राचीन संस्कृतीचा शोध कसा लागला याची हकीगत मनोरंजक आहे. १९०६ च्या जुलै महिन्यात. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे त्यांच्या अस्सल कागदपत्रे जमवायच्या मोहिमेत मजल दरमजल करत पोचले ते कोल्हापूरच्या उत्तरेला ४ मैलांवर असलेल्या एका छोट्याश्या गावंढ्या खेड्यात. त्याचं नाव होतं चिकुर्डे. कृष्णेच्या खोर्यात वारणा-मोरणेच्या संगमापासून जवळ असलेले हे गाव. त्या गावात धनगरांची मोठी वस्ती आजही आहे. त्यातल्या गावडे कुळातील एका बाईकडे असलेला ताम्रपट राजवाड्यांना पहायला मिळाला. त्यावेळेस त्याचा ठसा घेणे त्यांना शक्य झाले नाही, परंतु त्याचे वाचन करून तपशीलवार नोंद मात्र त्यांनी करून ठेवली व लगेचच १९०७ मध्ये विश्ववृत्त मधे या ताम्रपटाचे सटीक वाचन प्रकाशित केले. हा ताम्रपट कुण्या एका मन्नेय राम गावुंड या माहुताला जनमेजय चक्रवर्तिन नामक राजाने दिलेले गावांचे दान व मूलस्थानदेव नामक देवतेला दिलेली दाने नोंदवतो. भावसंवत्सरातील वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला हे दान दिले असा उल्लेख आहे. मात्र शकसंवताचा किंवा इतर कुठल्याच कालगणनेचा त्यात उल्लेख नाही. ताम्रपटाला एकुणात तीन पत्रे होते व एका कडीने ते बांधलेले होते. त्या कडीवर एका चौकोनी मुद्रेवर वराहाचे चिन्ह अंकित होते. वराह हे चालुक्यांचे राजचिन्ह. त्यावरून राजवाडेंनी अनेगुंदीवरून राज्यकारभार करणारा हा जनमेजय राजा चालुक्य वंशातील असावा असे अनुमान काढले. मात्र या ताम्रपटाचा काळ त्यांनी शके ६५८ (इ.स. ७३६) ठरवून मराठी भाषा इतकी मागे जाते असे प्रतिपादन केले. याचे परिणाम काय? तर हा ताम्रपट वादाच्या भोवर्यात सापडला. आधीच ताम्रपटाची कुठलीही 'प्रथमदर्शी प्रत' (eye-copy) नाही आणि त्यात राजवाड्यांसारख्या थोर विद्वानालाही अधूनमधून सबळ पुराव्याअभावी अतिरंजित निष्कर्ष काढायची सवय. त्यामुळे हा ताम्रपट 'तोतया (fake/forged)' आहे अशी त्यावर टीका झाली. गुणे, मार्शल, तुळपुळे यासारख्या भाषातज्ज्ञांनी ही भाषा आठव्या शतकातील नसून किमान ज्ञानेश्वरकालीन (१३व्या शतकातील) आहे , तसेच ही भाषा संपूर्णपणे मराठी नसून त्यात अनेक कानडी शब्द, प्रत्यय इ. आहेत असे ठाम प्रतिपादन केले, या सगळ्या भाषा-काल-निर्णयाच्या लठ्ठालठ्ठीत इतिहासाच्या दृष्टीकोनातून हा ताम्रपट काहीसा विस्मरणात गेल्यासारखा झाला. अनेको ताम्रपटांपैकी एक एवढीच त्याची फुटकळ स्वरूपातील नोंद नंतरच्या अभ्यासकांनी घेतली. समग्र राजवाडे साहित्याच्या एका खंडात त्या लेखाचे पुनर्मुद्रण झाले असले तरी त्यापल्याड त्याचे किती वाचन झाले असेल ही शंकाच आहे. सहसा ताम्रपटांमधे दान दिलेल्या गावाच्या, जमिनीच्या चतु:सीमा नमूद केलेल्या असतात. सुरुवातीला देवतास्तुती, राजाची प्रशस्ती, दानाचे स्थळकाळ-दाता-दान दिलेली व्यक्ती या सगळ्याचे तपशील, दानाचे वर्णन आणि शेवटी हे दान अमान्य करणार्याला उद्देशून शापवचन असा एक ठराविक साचा असतो. या चतु:सीमा म्हणजे कुठल्या दिशेला कुठलं गाव अथवा नदी आहे अशाच प्रकारचे तपशील सहसा असतात. मात्र चिकुर्डे ताम्रपट या बाबतीत फार वेगळा आहे. या चतु:सीमा नमूद करताना, फक्त आसपासची गावें, नदी, नाले, टेकड्या एवढेच वर्णन न देता, कुठे देवीचं ठाण आहे, कुठे शंकराचं ठाण आहे, कुठे वीरगळ आहे, कुठे विहिरी आहेत, सर्पमुखे कोरलेल्या शिळा आहेत, कुठे दगडांचे ढीग आहेत तर कुठे शेणाचे ढीग आहेत असे बारीकसारीक तपशील इथे नोंदवलेले दिसतात. आणि सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते एका 'धूळ-मातीच्या' ढिगार्यावर असलेल्या शर-परशु अंकित केलेल्या शिळा आहेत या वर्णनाने. नेहेमीच्या डोंगरापेक्षा वेगळे असे हे टेकाडासारखे ढिगारे म्हणजे पांढरीचे टेकाड असावे अशा टेकाडांवर अनघड किंवा घडीव शिळा किंवा तशा शिळेने/ शिळांनी बनलेले लक्ष्मी किंवा मारुती किंवा मरीआई किंवा अशाच एखाद्या देवतेचे ठाण असते हे अनेक ठिकाणी दिसते. शिवाय मुरार जगदेवने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला तेव्हा त्यावर एक शिळा/चिरा बसवला होता असा उल्लेखही वाचनात येतात तेव्हा हे असे दगड म्हणजे उजाड वस्तीचे/पांढरीचे निदर्शक (mound markers) असावे. आजवर पुरातत्वशास्त्रज्ञांनी या अशा निदर्शकांकडे फारसे लक्ष दिले नाहीये किंवा नोंदही केली नाही चिकुर्डे ताम्रपटातल्या वर्णनाचा. इतके बारकाईने स्थळपरिसराचे वर्णन करणारा, संभवत: पांढरीच्या टेकाडाचे उल्लेख करणारा असा हा लेख दख्खनच्या इतिहासात अभूतपूर्व आहे
पुराभिलेखावर आधारित सर्वेक्षणात सगळ्यात पहिल्यांदा जरूरीचे असते ते म्हणजे ताम्रपटात उल्लेखल्या गेलेल्या स्थळांची ओळख पटवून निश्चिती करणे (Place-name identification). या ताम्रपटामध्ये चिकलवाड, देवुलग्राम, स्ताणपग्राम, आयितग्राम व आमलकग्राम अशी गावांची नावे, वारुवेण्णा नदी, भैरवपाद, रुद्रपाद, भगवतीपाद अशी देवतास्थानांची नावे आदि माहिती आहे. या अशा लेखांमधे येणारी संस्कृत ग्रामनामे ही मुळातल्या देशी नावांचे 'संस्कृतीकरण' करून दिलेली असतात असे तज्ज्ञांचे मत आहे (उदा. इ.स. आठव्या शतकातील एका ताम्रपटात दापोडीचे नाव दर्पपुडिका म्हणून येते) एकुणात राष्ट्रकूट काळापासूनचे जुने शिलालेख व ताम्रपट बघता असे दिसून येते की दख्खनमध्ये (आणि भारतातल्या बर्याचशा प्रदेशांत) गावांच्या नावांमधे फारसा फरक झालेला नाही. नामसाधर्म्यावरून गावे बहुतांशी वेळा विनासायास ओळखता येतात. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात अनेको लेखांमधील स्थळांची निश्चिती ही सेन्सस रेकॉर्ड्स किंवा गॅझेट बघून केली गेली आहे. आता जिथे तपशीलवार टोपोग्राफिक सर्व्हे मॅप्स बघून स्थळनिश्चिती करायची मारामार तिथे प्रत्यक्ष जाऊन, सर्वेक्षण करून स्थळनिश्चिती पक्की करणे ही फारच दुर्मिळ गोष्ट! चिकुर्डेच्या बाबतीत मात्र याला एक अपवाद आहे. इतिहासाचार्य राजवाडेंचाच. त्यांनी लिहून ठेवले आहे की ऐन पावसाळ्यात हा ताम्रपट वाचल्यामुळे त्यांना आसपासच्या गावांमधून हिंडून स्थळनिश्चिती करता आली नाही. त्यांनी फक्त चिकलवाड = चिकुर्डे आणि आयितग्राम = ऐतवडे एवढीच निश्चिती नमूद करून ठेवली आहे. इतिहासलेखनामध्ये चिकुर्डे ताम्रपट फारसा महत्वाच न गणला गेल्यामुळे नंतरच्या अभ्यासकांनीही या स्थळनिश्चितीबद्दल आणखी काही काम केले नाही. डॉ. ठोसर यांनी आमलकग्राम = अळवली (ता.खानापूर, जि. सांगली) व स्ताणपग्राम = ठाणेगाव (ता, पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी दोन जागांची ओळख पटवायचा प्रयत्न केला. मात्र चिकुर्डेच्या आसपासची ही 'सीमेवर' असलेली गावे आहेत हा निकष त्यांनी न पाळताच ही निश्चिती केल्याने त्याला फारसा अर्थ नाही. चिकुर्डेच्या आसपास असलेली गावे व ताम्रपटात दिलेल्या दिशांची पडताळणी करून पुढीलप्रमाणे संभाव्य स्थळनिश्चिती केली गेली. चिकलवाड = चिकुर्डे, देवुलग्राम = देवर्डे, स्ताणपग्राम = थानापुडे, आमलकग्राम = मांगले, आयितग्राम = ऐतवडे बुद्रुक, चिकलग्राम = मांगलेच्या उत्तरेस असलेली चिखलवाडी व वारुवेण्णा म्हणजे या गावांच्या दक्षिणेला असलेली वारणा नदी. ऐतवडे बुद्रुक आणि खुर्द अशी दोन गावे आहेत परंतु ताम्रपटात दिलेल्या दिशांना प्रमाण मानता ऐतवडे बुद्रुक हे आयितग्राम असावे अशी संभावना जास्त आहे. यातील चिकुर्डे, देवर्डे, मांगले, ऐतवडे बुद्रुक (हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं गाव), ऐतवडे खुर्द, थानापुडे आणि या सगळ्या परिसराचाच भाग असणारे करंजवडे (याचा उल्लेख ताम्रपटात नाही) या सात गावांमध्ये व आसपासच्या परिसरामध्ये एक छोटेसे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. तेथील पांढरीची टेकाडे, खापरे, शिल्पे, वीरगळ, सतीशिळा, सर्पशिळा, मंदिरे इत्यादी सर्व प्रकारच्या पुरावशेषांची खानेसुमारी करून या गावांचे सांस्कृतिक कालानुक्रम, त्यांच्या वसाहतींची प्राचीनता निश्चित करण्यात आली. या कालानुक्रमांचा थोडक्यात तपशील पुढील प्रमाणे
(चिकुर्डे येथील पांढरीची तपासणी करताना)
चिकुर्डे: ताम्रपाषाणयुग - सातवाहन काळ - यादव काळ - मध्ययुग - अर्वाचीन/ सद्यकाळ (अंदाजे इ.स. पू. ३००० ते आजपर्यंत) देवर्डे: वरीलप्रमाणेच मांगले: वरीलप्रमाणेच थानापुडे: सातवाहन काळ ते आजपर्यंत (सुमारे इ,स. पहिले शतक ते आजपर्यंत) ऐतवडे बु|| : वरीलप्रमाणेच ऐतवडे खु|| : वरीलप्रमाणेच या सहाही गावांमध्ये पांढरी सध्याच्या गावाखालीच आहेत. मात्र करंजवडे गावात अशी पांढर नाही. त्याच्या हद्दीतल्या शिवारांमधे एका महालक्ष्मीच्या देवळाजवळ, ओढ्यापल्याड, पूर्वी एक पांढर होती अशी माहिती मिळाली. तिथे भेट दिली असता आज तिथे कसलेच अवशेष नाहीत परंतु देवळाशेजारच्या शेतात सातवाहनकालीन एक खापर मिळाले. ही 'महालक्ष्मी'ची मूर्ती १५-१६व्या शतकातील शैव मूर्ती असून तिला साडीचोळीने व मुखवट्याने सजवण्यात आलेले आहे.
धनगरांचा विठोबा
याशिवाय चिकुर्डेच्या हद्दीतच पण गावठाणाबाहेर वायव्येला धनगरांचे दैवत विठ्ठल-बीरदेव / विठोबा-बिरोबा यांचे एक मोठे मध्ययुगीन मंदिर आहे. इथला विठोबा मात्र पंढरीच्या विठुरायासारखा वैष्णवरूप धारण करून 'विटेवरी उभा' नाही तर चक्क त्याच्या आदिम धनगरी अनघड तांदळा स्वरूपात आहे. हा विठोबा तिथे कोल्हापूरजवळच्या कोडोली गावातून मजल-दरमजल करत, गावोगाव थांबत कसा आला त्याची मोठी सुरस आणि पाल्हाळिक कथा तिथल्या पुजार्याने सांगितात. त्याने ज्या ज्या गावांची नावे घेतली ती सर्व गावे मला सातवाहनकालीन वसाहती/ साईट्स म्हणून माहित आहेत. (म्हणजे विठोबाचा प्रवास तेवढा जुना नाहीये तर प्राचीन काळापासून असलेली गावे कशी मिथककथांमधे सामील होतात त्याचे हे मनोरंजक उदाहरण आहे.) तसेच इथे बिरोबाला नवसाचे मेंढे करून वाहतात. मात्र या सर्वेक्षणात ताम्रपटात नमूद केलेल्या ठिकाणी/ दिशेला सर्पशिळा, इतर कोरलेले दगड इ. मिळाले नाही. पण त्यात फारसे आश्चर्याचे काही नाही. कारण असे अवशेष हलवून एका जागेपासून दुसरीकडे नेले जाऊ शकतात/ भंगले म्हणून त्या दगडांचा पुनर्वापर होऊ शकतो इ. इ. तसेच लेखात उल्लेखलेल्या विहिरी, डोंगर, काही देवतास्थाने इ. वेळेअभावी तपासून बघता आली नाहीत. यासाठी आणखी सखोल आणि काही दिवस देऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. यासाठी जे फील्डवर्क केले गेले त्याचा अगदी सुरुवातीचा उद्देश होता तो म्हणजे ताम्रपटात उल्लेखलेली दोन पांढरीची स्थळे प्रत्यक्षात सापडताहेत का हे तपासून बघणे. या दोन उल्लेखांचा तपशील पुढीलप्रमाणे : - भगवतीपादाच्या (देवीचे ठाण) नजीक एक श्वेत-वालु-म्रितिका असलेले शेत आहे. आता हा लेख कानडीमिश्रित मराठीत असला तरी बर्याच ठिकाणी तो 'संस्कृतप्रचुर' आहे. संस्कृतमध्ये 'श्वेत-वालु-म्रितिका' असा कुठलाच वाक्प्रचार नाही. पण मराठीत पांढरी माती याचा निश्चित असा एक अर्थ आहे आणि तो म्हणजे (जुन्या) वस्तीची जागा. (माझ्या इतरत्र भटकंतीच्या अनुभवांनुसार पांढरी माती म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे कंकर/ डिपॉझिट्स असलेली जागाही असू शकते. रंगाला खरंचच पांढरी माती असते. पण इथे विचारणा केल्यावर तसे डिपॉझिट्स परिसरात असल्याची माहिती मिळाली नाही, तेव्हा मग वस्तीची जागा याच अर्थाने मी ह्याची संगती लावली).
- वराहतराह नामक ओढ्याच्या उत्तरेला धूळमातीचे ढिगारे (रजम्रितिका) असून त्यावर शर आणि परशु अंकन केलेले पाषाण आहेत. इथे रजम्रितिका की रज-त-म्रितिका असेल असा एक प्रश्न पडला - म्हणजे रजतम्रितिका असेल तर परत पांढरीमाती हाच अर्थ निघतो. आपल्याकडे ताम्रपटाची प्रत्यक्षदर्शी प्रत नसल्याने हे सगळे फक्त 'जर-तारी' कयासच राहणार. तर या दोन्ही उल्लेखातील एक संभाव्य जागा मिळाली. करंजवडेच्या शिवारांत असलेली महालक्ष्मी आणि तिच्या शेजारचे शेत (जिथे पूर्वी पांढरी होती) हे भगवतीपाद आणि तिच्या नजीकचे श्वेत-वालू-म्रितिका असलेले शेत असण्याचा दाट संभव आहे . मात्र धूळमातीच्या ढिगार्यांचा किंवा शरपरशुवाल्या शिळांचा पत्ता लागला नाही. अशा पद्धतीने संशोधनाच्या अगदी प्राथमिक उद्दिष्टात आम्ही काहीसे यशस्वी झाले असलो तरी संशोधनाचे निष्कर्ष एवढ्यावर संपत नाहीत. बाकी भाषा व ताम्रपटाचे इतर स्वरूप बघता त्याला इ.स. १३व्या शतकातील मानण्यास प्रत्यवाय नसावा. पण जर भगवतीपाद हे ठिकाण बरोबर ओळखलं गेलं असेल तर तिथली मूर्ती मात्र इ.स. १५-१६व्या शतकातील, म्हणजेच मध्ययुगाच्या सुरुवातीची, आहे. अशा स्थितीत मग लेखाचा काळ त्या मूर्तीनंतरचा मानावा लागेल. त्या मूर्तीआधी तिथे आणखी प्राचीन, पूर्वीची मूर्ती असल्यास कळण्याचा मार्ग नाही. किंवा मग भगवतीपादाची स्थळनिश्चिती चुकलेली असू शकते.
एक गंमतशीर बाब म्हणजे हा ताम्रपट तीन ताम्रपटांच्या 'संचा'तील एक आहे असे दिसते. मरमुरी ताम्रपट व मिरज ताम्रपट हे उरलेले दोन. तीनही वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळ्या काळी वाचन करून प्रसिद्ध केलेले हे ताम्रपट भावसंवत्सराच्या ज्येष्ठ व वैशाख महिन्यात दान दिलेले दिसतात. मरमुरी व चिकुर्डे एकाच तिथीला (वैशाख कृ. अष्टमी) दिले गेले आहेत, परंतु मरमुरी सोमवार व चिकुर्डे मंगळवार असा वारनिर्देश करतात. मरमुरी व मिरज हे चालुक्य राजा वीर सत्याश्रय याचे आहेत तर चिकुर्डे चालुक्य राजा जनमेजय याचा. हा जनमेजय चालुक्य तुलनेने अप्रसिद्ध असून त्याचे आणखी फक्त तीन ताम्रपट ज्ञात आहेत. तीन्ही कर्नाटकामधून मिळाले आहेत. मरमुरी ताम्रपट हा परत कुण्या एका राम गावुंड नामक माहुताला दान दिलेला आहे. हा आणि चिकुर्डेचा राम गावुंड एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिरज ताम्रपटही अन्य एका माहुताला दान दिलेला आहे - त्याचे नाव सैगोलपा. या तीनही ताम्रपटांमधील स्थळवर्णनात, भाषेत आणि लेखनशैलीत कमालीचे साम्य आहे. कदाचित एकाच 'लेखकु' ने ते रचले असावेत अशी शंका येण्याएवढे. तसेच या स्थळवर्णनशैलीचे जनमेजय चालुक्याच्या अनंतपूर ताम्रपटातील वर्णनाशीही साम्य आहे. चालुक्यांच्या काळातील भावसंवत्सरे पडताळून बघता मरमुरी ताम्रपटाचा काळ शके ११९६ (इ.स. १२७४) शी महिना-तिथी-वाराने तंतोतंत जुळतो. राजवाडेंनी जरी हे वर्ष मराठीची प्राचीनता मागे ओढण्यासाठी नाकारले असले तरी नंतरच्या अभ्यासकांनी चिकुर्डेची केलेली ही कालनिश्चिती खूपच संभवनीय आहे. मात्र तिथी-वार जुळत नसल्याने त्याच्या अस्सलतेवरचे पडलेले प्रश्नचिन्ह तसेच आहे. आणि यामुळेच इतिहासलेखनात, विश्लेषणात या ताम्रपटाला फारसे मूल्य नाही. ताम्रपट जरी नकली असला तरी इथे त्याचे मूल्य कमी होत नाही. कारण ज्या बारकाईने या लेखात आसपासच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक अवकाशाचे तपशीलवार वर्णन आलेले आहे, त्यात कशाप्रकारने नदी-नाले-डोंगर, शेते-शिवार-विविध प्रकारच्या जमिनी याचबरोबर देवतांची ठाणे, शिल्पे, कोरीव दगड, पांढरीची टेकाडे, शिल्पे, विहिरी इ. मानवनिर्मित गोष्टींचाही समावेश आहे, अवकाशातल्या महत्वाच्या खुणा म्हणून या गोष्टी ओळखल्या जातात (landmarks and/or boundary markers) हे जाणून घेणे व त्यातून त्या लेखाचे रचनाकार आणि वापरकर्ते यांच्या आसपासच्या परिसराकडे बघण्याचे सांस्कृतिक दूष्टिकोन समजावून घ्यायचा प्रयत्न करणे हा अतिशय रोचक असा अभ्यास ठरतो. ज्याला सैद्धांतिक पुरातत्त्वीय परिभाषेत landscape archaeology असे म्हणतात त्या दृष्टीने चिकित्सा करण्यासाठी असे पुरावे अनमोल ठरतात. जरी ते मध्ययुगात बनवलेले नकली दस्तावेज असले तरी. शिवाय हे असे नकली दस्तावेज का बनवले गेले असावेत याचाही अभ्यास रोचक ठरतो. प्रत्येक वेळेस फक्त जमीनीच हक्क शाबूत रहावा, नव्याने मिळावा म्हणूनच नव्हे तर इतरही सामाजिक आर्थिक पैलू त्यात असू शकतात. लेखाबरोबरच तत्कालीन इतर पुरावे, मौखिक इतिहास, पुरातत्वीय अवशेष असे सगळे साकल्याने अभ्यासले तर अशा कारणांचा माग लागू शकतो (मी अशाच प्रकारचे आणखी एक काम केले आहे. पण ते अजून प्रकाशित झाले नसल्याने इथे संदर्भ देत नाही. प्रकाशनाला गेले की त्यावरही एक लेख पाडेन..) त्यामुळे ताम्रपटांकडे बघताना फक्त अस्सल की नकल हा मुद्दा न बघता त्याचा साकल्याने विचार करावा, या ताम्रपटात अभूतपूर्व उल्लेख असलेली बाब म्हणजे पांढरीची माती अथवा टेकाडे. पारंपरिक भारतीय लिखाणातील हा ज्ञात दुसरा तर जुन्या लेखांमधे मिळालेला हा असा पहिलाच पुरावा होय. या आधी भीमा-माहात्म्य नामक अप्रकाशित संस्कृत ग्रंथात धूळखेड नामक कर्नाटकातील गावात आढळणार्या नवाश्मयुगीन राखेचे ढिगार्यांच्या अस्तित्वाचा (हे दख्खनच्या ताम्रपाषाणयुगाला समकालीन असलेले समाज मोठ्या प्रमाणावर खिल्लारे बाळगत असत व शेणाचे ढिगारे जमवून जाळत असत. त्यामुळे त्यांच्या वसाहत स्थळांजवळ मोठेमोठे राखेचे ढिगारे आढळतात) कार्यकारणभाव दक्षयज्ञ झाला तीच ही जागा असे मिथक वापरून स्पष्ट केला आहे हे मी अन्यत्र एका शोधनिबंधात सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र इथे कुठल्याही मिथकाचा, कथेचा आधार न घेता भवतालच्या परिसरातील एक मोठी खूण अशा तर्हेने या अवशेषांची दखल घेतली गेली आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे. मरमुरी ताम्रपटातही असाच पांढरीचा उल्लेख आहे. तसेच जनमेजय चालुक्याच्या अनंतपूर ताम्रपटाच्या इंग्लिश भाषांतरातही 'mound' असा परिसरातील एका स्थळाचा उल्लेख केलेला आहे. मात्र आजवर या शब्दाची चिकित्सा/छाननी झालेली नाही. पुरातत्वीय सर्वेक्षणाची आखणी करताना कलोनियल/ब्रिटिश काळातील कागदपत्रे, नकाशे, प्रवासवर्णने व इतर नोंदींचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कारण पाश्चात्य परंपरेनुसार परिसराचे, प्रदेशाचे सर्व बारीकसारीक तपशील, नैसर्गिक - सांस्कृतिक खुब्या इ, दस्तावेजामध्ये साग्रसंगीत नमूद केलेले असते. आपल्याकडे पाश्चात्य परंपरेसारखी तटस्थ परिसरवर्णनाची, भौगोलिक वर्णनाची परंपरा नाही हे खरेच, परंतु तरीही वेगळ्या संदर्भात का होईना पण पारंपरिक भारतीय साहित्यात असे उल्लेख असू शकतात याचीही जाणीव दुर्दैवाने आजपर्यंत पुरातत्वशास्त्रात फारशी कुणाला झालेली आढळून येत नाही. किंबहुना त्या दृष्टीने कधी साहित्य- जुने लेख वाचलेच गेले नाहीत हे खरे! मात्र वरील दोन उदाहरणे बघता असे ठाम प्रतिपादन करू इच्छिते की सर्वेक्षण आखणी करण्याच्या पद्धतीमध्ये (survey methodology) त्यात्या प्रदेशाशी संबंधित सर्व प्रकारच्या पारंपरिक साहित्याच, लेखांचा, मध्ययुगीन कागदपत्रांचा सखोल आढावा घेऊन त्यात असे - म्हणजे पुरातत्वीय अवशेषांकडे निर्देश करणारे - तपशील आले आहेत का ही तपासणी करणे गरजेचे आहे. वरील उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की किमान पूर्वमध्ययुगापासूनचे - साधारण यादवकाळापासून -समाज त्यांच्या आसपास असलेले पुरातन अवशेष, पांढरीची टेकाडे याविषयी, त्यांच्या इतर नैसर्गिक भौगोलिक घटकांपेक्षा असलेल्या वेगळेपणाविषयी जागरूक होते. (माझ्या एका अन्य लेखात गावांची नावे ७-८व्या शतकापासून कशी संभवतः तिथे मिळणारे जुनी खापरे अथवा पांढरी यावर आधारित आहेत याचे सप्रमाण विवेचन केले आहे). दख्खनसारख्या अर्धदुष्काळी प्रदेशात असे दिसून येते की अनेको गावे/ वसाहती सहसा एकाच जागेवर किंवा त्याच परिसरात जवळपास जागा बदलत हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. मध्ययुगात किंवा पूर्वमध्ययुगात (early medieval) काळात महत्वाची गणली जाणारी स्थळे खूप प्राचीन असण्याचा संभव असतो हेही मला भीमा खोर्याच्या सर्वेक्षणात सप्रमाण लक्षात आले आहे. आजपर्यंत सर्वेक्षण आखणी करताना भौगोलिक व प्रादेशिक घटक, पाणी-जमीन इ, ची उपलब्धता/अभाव, दळणवळणाच्या मार्गांशी संबंध या व अशा घटकांना प्रामुख्याने लक्षात घेतले जाते. प्राचीन साहित्याचा वापर फक्त गावांची नावे व त्यांचे प्रशासकीय स्थान, व्यापाराशी संबंध यांचे उल्लेख आहेत का हे जाणून घेण्यासाठी केला जातो. पण त्यापल्याड जाऊन असे प्राचीन, पूर्वमध्ययुगीन व मध्ययुगीन दस्तावेज तपासून पुरावशेषांचे तपशील आले आहेत का ते तपासून त्या माहितीचा अंतर्भाव जाणीवपूर्वक सर्वेक्षण आखणीतील आधारभूत घटकांमध्ये केला जाणे गरजेचे आहे.
ऐतवडे बु|| येथील पांढरीच्या मातीने सारवलेल्या भिंती आणि त्यातील खापरे
मांगलेतल्या एका चौकात मिळालेले एक खापर उचलले, तर ते दख्खनच्या ताम्रपाषाणयुगातील सुरुवातीच्या कालखंडातील - माळवा कालखंडातील - खापर निघाले. लखलखीत गेरू रंगाच्या खापरावर काळ्या रंगाने काढलेली सुंदर नक्षी असलेले. आणि चिकुर्डे आणि देवर्डेमधून ताम्रपाषाणयुगाच्या अंतकाळाची, उत्तरजोर्वे कालखंडाची, छोटीछोटी खापरे मिळाली. आजवर इनामगावचे उत्खनन व भीमा खोर्यातल्या काही संशोधकांना मिळालेल्या स्थळांशिवाय उत्तरजोर्वे खापरे बाहेर कुठेच कधीच मिळाली नव्हती. ती इथल्या सुपीक, उत्तम पाऊस आणि बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या प्रदेशांतून मिळाली हा अतिशय महत्वाचा शोध आहे. खापरे/ मातीच्या मडक्यांचे तुकडे हे प्रत्येक काळी प्रत्येक प्रदेशात वेगवेगळे असतात. त्यांचा पोत, रंग, भाजणी यात फरक असतो. एकासारखी खापरे परत तश्शीच दुसरीकडे, आधी/नंतर बनत नाहीत. त्यामुळे ती प्रत्येक कालखंडाची, प्रदेशाची, संस्कृतीची निर्देशक ठरतात. गेल्या शंभरपेक्षाही जास्त वर्षे भारतात उत्खनने झालेली असल्याने कुठल्या प्रदेशात कुठल्या काळात कायकाय प्रकारची खापरे मिळतात याचे सखोल ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे खापरे बघून तिथल्यातिथे साधारण कालनिर्णय करता येतो. फक्त त्यासाठी खापरांचे सखोल ज्ञान हवे. ही खापरे सहसा इतकी पक्की भाजलेली असतात की साहजिकच मातीत खराब होत नाहीत किंवा 'डिसइन्टिग्रेट' होत नाहीत. आपल्याला पश्चिम दख्खनच्या इतर प्रदेशांतही बारकाईने सर्वेक्षण करण्याचा आणि त्यातून मिळणार्या माहितीच्या संदर्भात या अंतकाळाचा एकदा साकल्याने फेरविचार करायची नितांत गरज आहे .
संदर्भ :
१) https://timesofindia.indiatimes.com/city/kolhapur/maharashtra-2000-year-old-sangli-labyrinth-to-be-conserved/articleshow/91364130.cms २ ) digitalsakshar.com ३ ) https://www.etvbharat.com/mr/!state/footprints-of-stone-age-history-rare-rock-paintings-found-in-chandrapur-district-maharashtra-news-mhs25052800467 ४ ) loksatta.com ५ ) discovermh.com ६ ) https://www.mymahanagar.com/featured/saransh/discovery-of-the-stone-age-chitrashala-in-maharashtra/ ७ ) marathivishwakosh.org ८ ) Childe, Gordon, New Light on the Most Ancient East, London, 1958. ९ ) Clark, Grahame, World Prehistory–An Outline, Cambridge, 1961. १० ) Clark,Grahame Piggott, Stuart, Prehistoric Societies, London, 1965. ११ ) Day, Michael M. Guide to Fossil Man, London, 1965. १२ ) Jacquetta, Hawkes Wooly, Leonard, Prehistory and the Beginnings of Civilization History of Mankind, Vol.1, London, 1963. १३ ) Leakey, L. S. B. Adam’s Ancestors, London, 1960 १४ ) https://www-metmuseum-org.translate.goog/perspectives/cycladic-figures?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc&_x_tr_hist=true १५ ) sinhasannews.com १६ ) http://amolpalye.blogspot.com/2018/08/blog-post_27.html १७ ) kokanmedia.in १८ ) pudhari.news १९ ) ratnagirikhabardar.com २० ) marathi.freepressjournal.in २१ ) lokmat.news18.com २२ ) https://www.royalbhatka.com/2023/02/blog-post.html २३ ) kevinstandagephotography.wordpress.com २४ ) iyemarathichiyenagari.com २५ ) konkantoday.com २६ ) marathivishwakosh.org २७ ) kokansadlive.com २८ ) https://www.maayboli.com/node/11014 २९ ) bolbhidu.com ३० ) itihasmaala.blogspot.com ३१ ) thepostman.co.in ३२ ) thinkmaharashtra.com ३३ ) Atkinson, R. J. C. Field Archaeology, London, 1950. ३४ ) Ceram, C. W. A Picture History of Archaeology, London,1958. ३५ ) Charles- Picard, Gilbert, Ed. Larousse Encyclopedia of Archaeology, New York, 1972. ३६ ) Clark, G. Prehistoric Societies, London, 1965. ३७ ) Crawford O. G. S. Archaeology in the Field, London, 1953. ३८ ) Daniel, Glyn, A Hundred and Fifty Years of Archaeology, London, 1972. ३९ ) Leone, M. P. Ed. Contemporary Archaeology, London, 1975. ४० ) Roy, S. Indian Archaeology from Jones to Marshal : Ancient India No.9, Delhi. 1953. ४१ ) Taylo, Joan du Plat, Marine Archaeology, London, 1965. ४२ ) Wheeler, R. E. M. Archaeology from the Earth, London, 1961. ४३ ) देव, शां. भा. पुरातत्त्वविद्या, पुणे, १९७६. ४४ ) https://www.peepultree.world/livehistoryindia/story/eras/inamgaons-mysterious-burial?srsltid=AfmBOorz7fMYa0a3VTlpzXigJqVeBF6FZCGFQ2c44l9ZXLjsJ2nGV_Tk ४५ ) https://chandrashekhara.wordpress.com/2013/09/04/%e0%a4%85%e0%a4%a1%e0%a4%b8%e0%a4%b0/ ४६ ) chandrashekhara.wordpress.com ४७ ) https://www.vyakarangyan.com/2021/09/chalcolithic-period-general-knowledge.html ४८ ) http://historyofsatara.blogspot.com/2009/09/blog-post_5793.html ४९ ) https://prachinandmordarnbharatitihas.blogspot.com/2022/04/blog-post_85.html ५० ) http://mhavaibhav2.blogspot.com ५१ ) https://www.tarunbharat.net/Encyc/2023/4/30/71-stone-circles-found-at-Yesamba-Shila.html ५२ ) http://mr.upakram.org/node/3448 ५३ ) https://www.misalpav.com/node/50636 ५४ ) पुरातत्वविद्या:- श्री. शां.भा.देव,१९७९ ५५ ) महाराष्ट्रातील पुरातत्व:- श्री. ह.ध. सांकलिया आणि म.श्री. माटे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ, १९७६ ५६ ) laxmankatekar.wordpress.com ५७ ) https://www.discovermh.com/history-of-khandesh-1/ ५८ ) https://mahanagarnews.com ५९ ) weeklysadhana.in ६० ) marathi.indiatimes.com ६१ ) https://www.bbc.com/marathi/india-45187961 ६२ )
खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास –
पुरातत्वेत्यांनी
गिरणा आणि तापी नदीच्या परिसरात केलेल्या उत्खननामुळे या प्रदेशातील
प्रागैतिहासिक काळातील भटक्या मानवाची वस्तुरूप संस्कृती काही प्रमाणात
उजेडात आली. तापीच्या खोऱ्यात जवळपास पंधराशे एवढी मानवी वसतीचे पुरावे
असलेली स्थळे डॉ.वसंत शिंदे आणि इतर तज्ञांनी शोधली आहे. या दोन्ही
नद्यांच्या काठी मिळालेल्या प्राचीन अश्मयुगीन हत्यारांमुळे जळगाव परिसरात
एक-दीड लाख वर्षांपूर्वी मानव वस्तीला राहत असावा. चांगदेवपासून अवघ्या
तीन किलोमीटर आग्नेयेस असलेल्या मानेगावी आद्य पुराश्म युगातील म्हणजे काही
अवशेष सापडले आहेत.(खानदेशातील मानवी वसाहतीचा इतिहास)
बी.पी.बोपर्डीकर
यांनी उत्खनन केले आहे. “Early stone age site at Manegav of the Purna
river, Jalgaon district Maharashtra, indian antiquity असा त्यांचा लेख
इंडियन अंटीक्वेरी खंड 4 मध्ये 1970 मध्ये प्रसिद्ध झाला.
पाटणे या
गावी चाळीसगाव तालुक्यातील, मध्यपुराश्म युगाच्या(middle paleolithic)
म्हणजे शेवटच्या काळापासून उत्तर पुराश्म युगातील म्हणजे अप्पर पेलीओलेथिक
आणि त्यापुढील मध्याश्मयुगातील म्हणजे मेझोलेथिक काळात मानवी वसाहतींचे
यांचे पुरावे आढळले आहेत. पाटणे येथील उत्खननाचा रिपोर्ट बघितल्यास आपल्यास
ही माहिती मिळते. पाटणे बद्दल सविस्तर वेगळा लेख लिहिन. यावरून खानदेशात
इसवी सन पूर्व दिड लाख ते एक लाख वर्षे या कालावधीत मानवी वसाहत होती.
गिरणेच्या काठी येथे बहाळ आणि टेकवडे येथे 1952 व
57 मध्ये केलेल्या उत्खननावरून ताम्रपाषाण युगात इसवी सन पूर्व २७०० ते इ.स. सहाशे येथे निश्चित मानवी वसतीचे पुरावे मिळाले आहेत.
खानदेशातील मध्य पुराश्मयुग
पुर्व पुराश्मयुगीन खानदेशातील
दुसरे स्थान म्हणजे भाडणे हे होय. हे धुळे जिल्ह्यातील कान नदीच्या काठावर
साक्री तालुक्यातील आहे. कान ही पांजरा नदीची उपनदी आहे, पांजरा तापी नदीची
उपनदी आहे. एस.ए. साळी यांनी १९७८ मध्ये या स्थळाचा शोध लावला आणि बारा
मीटर उंचीचे चार गाळाचे ढिगारे बघितले. तीन वेगवेगळ्या थर असलेली होय. तिथे
सापडलेली अश्युलियन अवजारे सर्वात खालच्या थरात सापडली ती बरीच सुस्थितीत
होती आणि बसाल्ट आणि डोलेराइट या दगडापासून बनवलेले आहेत.
महाराष्ट्रातील
महत्त्वाचे स्थळ ज्यापासून पुर्व पुराश्मयुगीन अभ्यास सुरू झाला ते म्हणजे
गोदावरी नदीच्या खोऱ्यातील चिरकी नाला जो प्रवरा नदीच्या काठावर आहे.
नेवासा जे अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण आहे. याशिवाय मध्य पुराश्मयुगातील
रनाळे आणि रायगड ही तापीच्या खोऱ्यात नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाच्या
फॅक्टरी साईट आहे, येथे ताच्येलाईट लाल रंगाची बारीक बसाल्टचा वापर केला
आहे.
खानदेशातील मध्य पुराश्मयुग
हा काळ पुर्व
पुराश्मयुगाचाच सलग असतो, या काळातील भारतीय अवजारे ही आकाराने लहान,
उत्कृष्ठ पोताची दगड वापरलेली, बारीक बारीक छिलके काढून संस्कार केलेली
आढळून येतात, त्याचे प्रकार म्हणजे तासण्या, नोक हत्यारे, क्षुद्र छिन्नी
किंवा उत्किर्णक होय. या काळात अवजारे ही छिलक्यापासून बनवली जात आणि
निअंडरथल मानव अस्तित्वात होता.
मध्यपुराश्मयुगातील मानव
युरोपातील उपलब्ध पुराव्यानुसार समाज निर्माण झाल्याचे दिसून येते. या
काळात हवामान अत्यंत थंड असल्याने तत्कालीन मानवाला झोंबणार्या गार
वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी उघड्यावर राहण्याऐवजी नैसर्गिक मध्ये किंवा
नैसर्गिक सारखा पुढे आलेल्या खडकाचा आश्रय घेऊन राहावे लागले आणि अनेक गट
एकत्र आल्याने कदाचित निरनिराळ्या गटांमध्ये एकत्र समाजाची भावना निर्माण
झाली असावी. कदाचित प्राथमिक कुटुंब संस्थेचा उगम झाला असावा आणि या
भावनेतूनच मृत व्यक्तीचे अत्यंत काळजीपूर्वक करण्याची प्रथा या काळात
प्रचलित झाली असावी. कुटुंबसंस्थेतूनच मग प्रेम भावना निर्माण होते आणि
त्यामुळे हे प्रेम मृत्यूनंतरही कायम टिकावे म्हणून काळजी घेतली जाते. या
काळात फ्रान्स, चीन, पॅलेस्टाईन येथील लहान मुलांची अत्यंत काळजीपूर्वक
केलेली दफने साक्ष देतात. त्या काळात आकाराने लहान परंतु अत्यंत
काळजीपूर्वक व रंगीबेरंगी दगडांची केलेली अवजारे आढळतात.
मध्यपुराश्मयुगात
युरोप मधील मानव नैसर्गिक गुहा तसेच शैलाश्रयाने रहात होता, चीनमधील
चौकुतीन गुहांमध्ये मानवी कुटुंब एकत्र रहात असल्याचे दिसून येते.
१९५४
साली सांकलिया यांनी पहिल्यांदा प्रवरा गोदावरी नदीच्या खोऱ्यात तासण्या,
तिराग्रे आणि वेधण्या आढळून आले. विशेषतः खालील बाबींचा समावेश याकाळाचा
अंदाज घेण्यासाठी केला जातो. अर्थातच हा टप्पा पुर्वपुराश्मकाळ आणि उत्तर
पुराश्मकाळातील आहे. कुठल्या प्रकारचे अवजारे सापडतात? ते बनवण्याचे तंत्र
काय होते? काही स्थळांवर समध्वय दिसतो का? अर्थातच तुलनात्मक अभ्यास,
अवजारांचा वापर कशासाठी होत होता? काय मटेरीयल वापरलेले आहे. ? स्तरवार
उत्खननात कोणत्या थरात सापडली आहेत? स्थळांचा प्रकार काय आहे? नदीच्या
खोऱ्यात, फक्टरी साईट, डोंगरावर की सपाट जमीनीवर होय. त्या स्थळावरील
त्याकाळातील पर्यावरण काय होते? त्याचा मानवी जीवनात काय परिणाम झाला वगैरे
वगैरे.
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात ठिकाणी झालेल्या
अभ्यासातील रेडीओ कार्बन कालमापन पध्दतीने काळ इसवीसन पुर्व ४०,०००-१०'०००
एवढा मोठा आहे. या साठी पाण्यातील शिंपले, अर्ध कार्बनाईज झालेले लाकुड आणि
हाडे हे मटेरीयल वापरलेले आहेत. थर्मोल्युसन्स आणि युरेनियम/ थोरीयम
पध्दतीने काढलेल्या काळाचा तारखा राजस्थान येथील मध्य पुराश्मयुग १,५०,०००
ते १००,००० एवढा येतो. महाराष्ट्रातील चिरकीनाला प्रवरा अहमदनगर जिल्हा,
वाडोलीवाघोली हे गोदावरी नदीच्या खोऱ्यातील औरंगाबाद जिल्हा, पाटणे आडनाला
जळगाव जिल्ह्यातील, महाराष्ट्रात प्रातिनिधिक समजले जाणारे म्हणजे नेवासा
आणि पाटणे ही दोन स्थळे आहेत.
कार्बन २४ या कालमापन पद्धतीच्या
सहाय्याने पूर्व पुराश्मयुगाचा भारतातील काळ निश्चितपणे आज पासून एक लक्ष
वर्ष एवढा होता, काही ठिकाणी तो १४ लक्ष तसेच त्याच्याही मागे जाण्याची
सुद्धा शक्यता आहे. भुगर्भ शास्त्राच्या परिभाषेत तो पूर्व ते मध्य
प्लायस्टोसीन युगा इतका आहे तर मध्य पुराश्मयुगाचा काळ हा मध्यप्लायस्टोसीन
ते उत्तर प्लायस्टोसीन म्हणजे आज पासून एक लाख वर्ष पूर्व ते ४० हजार वर्ष
पूर्व एवढा होतो. या काळात पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे बदल घडून आले
असे भूगर्भ शास्त्रज्ञ मानतात. पृथ्वी दुसऱ्या अंतरहिमाचा अनुभव घेत होती
असे दिसते. पर्यावरणात झालेल्या या फरकामुळे मात्र प्रत्यक्षात जीवसृष्टी
आणि हवामान यात फरक पडलेला दिसत नाही.कदाचित तेव्हापासून मानवाच्या
मेंदूमध्ये अधिक प्रगल्भता निर्माण झाली असल्यामुळे त्यांची हत्यारे प्रगत
तंत्राची आणि जास्त कौशल्यपूर्ण अशी होती. मोठ्या आकाराच्या हात कुऱ्हाड
किंवा त्यांच्या अभावी मध्यपुराश्मयुगात मानवाने कठीण दगडाचा जास्त सुबक
तंत्रान घडवलेल्या तासण्या, बाणांची टोके, गिरमिटे, पाती, चाकु इत्यादींचा
अंतर्भाव असलेले प्रभावी हत्यारे तयार केली. या हत्यारांचे वैशिष्ट्य असे
होते की लहान-लहान घडवलेल्या चिपा एका मोठ्या लाकडाच्या अथवा हाडाच्या
खोबणीत बसवून त्यापासून त्याचे एक मोठे हत्यार तयार केलेले दिसते. दुसरे
असे की अवजडपणा जाऊन आकारात सुटसुटीतपणा आल्याने हत्यारांचा पल्ला वाढला
आणि त्याच्यात अचूकता आली आणि ती अधिक परिणामकारक रित्या शिकार करण्यासाठी
वापरता आली. जनावरांच्या कळपात पिटाळत नेऊन उंच ठिकाणावरून खाली हाकलत
पाडून मारण्याच्या शिकारीच्या तंत्राबरोबरच परिणामकारक रित्या प्राणी किंवा
पक्षी यांचे यशस्वी शिकारी तंत्र मानवाने आत्मसात केले, या दगडाच्या उपयोग
बनवण्यासाठी उपयोग झाला.
पुरातत्त्वज्ञ एस ए. साळी यांच्यामते
मध्यपुराश्मयुगाचे सुरुवातीच्या काळात जे काही भूगर्भातील प्रचंड
स्थित्यंतरे ज्याला टेक्टनिक मोवहमेंट्स म्हटले जाते. त्याचे परिणाम तापी
खोऱ्यात ही झाले. आणि त्याच काळात पाटणाच्या दक्षिणेला अजिंठा डोंगराच्या
पायथ्याशी एक खोलगट भाग तयार झाला. अनेक दृष्टीने सुरक्षितता लाभलेल्या या
भागात चाळीस हजार वर्षापासून म्हणजे मध्य पुराश्म काळात च्या शेवटच्या
काळापासून ते उत्तर पुराश्म काळात या भागात मानव वस्ती करून राहू लागला. या
युगातील मानवी वसाहतींचे पुरावे दर्शवणारे पाटणे हे एक स्थान आहे. या
काळातील पाषाण आयुधे ही पाटणे येथे सापडली आहेत.
मध्य
पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग आणि मध्याश्मयुगात म्हणजे काळात या भागात
महत्त्व आहे. या उत्खनन स्थानामध्ये पाटणे विशेष महत्वाचे आहे. पाटणे
अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी तीन बाजूंनी डोंगर कडा असलेल्या वर्तुळाकार
दीर्घ नाट्यशाळे सारख्या खोऱ्यात आहे. या भागातील भुस्तरात कंकर म्हणजे दगड
गोटे, गाळ, वाळू व मातीचा अंदाजे १० ते २० मीटर थर आहे. या थरात एस.ए.
साळी यांनी दोन वेळा उत्खनन केले. त्यात त्यांना भुविज्ञानविषयक तेरा थर
आढळले. त्यात सर्वात खालचा थर हा मध्य पुराश्म युगातील असून त्यातील आठ थर
उत्तर पुराश्म युगातील आहे. सर्वात वरचे चार थर हे मध्याश्मयुगातील
असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर पुराश्म युगातील आठ थरांची जाडी एकूण ५.५
मीटर असून क्रमांक पाच आणि सात वर मानवनिर्मित कला वस्तूंची समृद्ध आहेत
आणि त्यांच्यात अनुक्रमे ११,७८८ आणि १२३०३ एवढे विविध नमुने आढळले आहेत,
तसेच उत्तर पुराश्म युगातील शहामृगाच्या अंड्यांची शंभराहून अधिक नमुने
सापडले आहेत. त्यातील तीन नमुने उत्तर पुराश्म युगातील असून अंड्याच्या
कवचावर जाळीची नक्षी दिसून येते. या ठिकाणी शहामृगाच्या अंड्यापासून
बनवलेले तीन चपटे मणी आणि नदीच्या मुखाजवळील प्रदेशात शंखा पासून बनवलेल्या
मण्यांचेही नमुने सापडले आहेत. ते उत्तर पुराश्म युगातील आहे, या काळातील
मानवी कलावंत एकत्रित वसाहत करून रहात असल्याचा सर्वात मोठा आधीचा पुरावा
मानला जातो.
मध्य पुराश्म युगातील अणुकुचीदार हत्यारांचा वापर
मानवाच्या सुरुवातीच्या अवस्था दाखवतो. उत्तर पुराश्म युगातील काळात मानव
जा स्वर दगडापासून हत्यारे बनवी तर याच काळातील नंतरच्या काळात मानव म्हणजे
पांढरा चकचकीत दगड किंवा गार यापासून हत्यारे बनू लागला. नंतरची हत्यारे
त्याच्या अर्धचंद्राकार, विषम, चतुर्भुज व त्रिकोणी आकारावरून ओळखता येतात.
या भागात मध्य पुराश्मयुगा पासून ते मध्याश्मयुग म्हणजेच मेझोलिथिक काळा
पर्यंतचे भूस्तर विज्ञान विषयक मानवी अवशेषांचे स्पष्ट पुरावे आढळून
आल्याने पाटणे स्थानास असाधारण महत्त्व प्राप्त झाले. मध्य पुराश्म व उत्तर
पुराश्मयुगामधील अवशेषांप्रमाणेच त्यानंतर येणारी अवस्था म्हणजे मध्याश्म
युगातील जे मेझोलीथिक कल्चर म्हटले जाते,त्याचेही पुरावे पाटणे येथे मिळाले
आहे. मध्याश्मयुगाचेही तीन कालखंड मानले जातात. असे पाच कालखंड साळी यांनी
पाटणेच्या संदर्भात मांडले आहे. अर्थातच हे उत्तर पुराश्मकाळानंतरचे होय.
पहिला
कालखंड हा उत्तर पुराश्मकाळानंतरच्या काळात यात विविध प्रकारच्या पाती आणि
विविध टोकांची अश्मयुगीन हत्यारे सापडतात. दुसरा कालखंडात बरेच बदल दिसून
येतात, यात कोळशांचे बारीक तुकडे आणि भाजलेल्या मातीचे पुरावे दिसतात तर
शेकोटी आणि स्तंभछिद्रांचे अस्तित्व दिसते. वाऱ्याने उडून आलेल्या मातीतील
निक्षेपात भुस्तरावरील भाजक्या विटांसारखे पट्टेही दिसतात.
तिसऱ्या
कालखंडात मध्याश्मयुगातील तीनही कालखंड पाटणे येथे दिसतात. एकंदर आद्य
पुराश्मयुग इसवी सन पूर्व दिड लाख वर्षे ते एक लाख वर्षांपूर्वी, मध्याश्म
पुराश्मयुग इसवी सन पूर्व एक लाख ते तीस हजार वर्षे आणि उत्तर पुराश्मयुगात
इसवी सनपूर्व तीस हजार ते दहा हजार वर्ष, मध्याश्मयुग इसवी सन पूर्व दहा
हजार ते चार हजार वर्षे आणि नवाश्मयुग इसवी सन पूर्व चार हजार ते दोन हजार
सातशे वर्षे अशा या पाच अवस्था आहेत. पाटणे भागात उत्तर पुराश्म युगातील
म्हणजे तीस हजार वर्षापूर्वी मानवी वस्ती असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत
म्हणूनच पुरातत्त्वज्ञ एस.ए. साळी यांच्या मते तीस हजार वर्षाच्या काळात
हवामानात विषयक महत्त्वाचे बदल घडून आले नसले तरी परिस्थितीत निश्चित बदल
होत गेले आणि नदीला त्यांनी वाहून आणलेला गाळ पसरून मैदानी भाग तयार झाला.
गवत आणि वनस्पती उगवल्या, हत्यारे तयार करण्यासाठी गारांचे दगड त्या खडकात
मुबलक उपलब्ध होते. नदी नाल्यात काही ठिकाणी डोह निर्माण झाले. मैदानी
प्रदेशात गवताळ भागात शहामृग तसेच मोरासारखे मोठे पक्षी व घोडे यांसारखे
प्राणी राहत. अशा परिस्थितीत सातमाळा डोंगराच्या पायथ्याशी मानवाने आपले
गावठाण स्थापन केले, या पाच अवस्था वरून हळूहळू कसा विकास होत गेला हे
लक्षात येते.
( एस. ए. साळी यांनी रघुनंदन या चाळीसगाव येथील
मासिकात " पाटण्यातील मानवी जिवनाची तीस हजार वर्षे" १९८८ मधील लेखात
सविस्तर लिहिले आहे. तसेच "दि अप्पर पॅलिओलिथिक कल्चर ऑफ पाटणे, डिस्टिक
जलगाव, महाराष्ट्र" यालेखात तसेच "रिसेंट ॲडव्हान्सेस इन इंडो पॅसिफिक
हिस्टरी, १९८५, या लेखात आर. एस. पप्पू यांनी लिहिले आहे. "स्टोन कल्चर ऑफ
महाराष्ट्र" महाराष्ट्र स्टेट गॅझेट मध्ये तर, हिस्टरी: एन्शंट पिरीयड, यात
तोकडीच माहिती आहे असे म्हणायला हरकत नाही. पुरातत्त्वज्ञ साळी यांनी या
भागात १९७१ ते १९७५ असे दोन वेळा उत्खनन करून सलग तेरा वर्षे संशोधन केले
आहे.)
जोर्वे : महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन प्राचीन
अवशेषांचे एक स्थळ. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरपासून पूर्वेस सु. ८ किमी.वर
प्रवरा नदीकाठी ते वसले आहे. अकराव्या शतकातील काही शिलालेखांत याचा
‘जउरग्राम’ असा उल्लेख येतो. स्थानिक परंपरेनुसार ‘जरासंधनगरी’ म्हणून हे
ओळखले जाते. प्राथमिक सर्वेक्षणात येथे ताम्रपाषाणयुगीन मातीची भांडी आणि
गारगोटींच्या छिलक्यांची हत्यारे सापडली. त्यामुळे महाराष्ट्रात ताम्रयुग
झालेच नाही, या मताचे खंडन झाले.
संदर्भ :
1. Sankalia, H. D. Deo, S. B. Report on the Excavations at Nasik and Jorwe, Poona, 1955.
२. देव, शां. भा. महाराष्ट्र-एक पुरातत्त्वीय समालोचन, मुंबई, १९६८.
देव, शां. भा.
इनामगाव :-
हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले आहे.
And the Quest goes on....
संदर्भः
वरील लेखात उल्लेखलेल्या सर्व पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन अहवाल
नकाशे आणी प्रकाशचित्रे -उत्खनन अहवाल व 'First Farmers of the Deccan' - M. K. Dhavalikar
इनामगाव येथे, वस्तीचा पश्चिमेकडील भाग कारागिरांचे निवासस्थान म्हणून काम करत होता, उत्खननात कुंभारकाम, हस्तिदंती कोरीवकाम, तांबे आणि सोने आणि चुना बनविण्याचे काम करणारे तज्ञ असल्याचे पुरावे मिळाले आहेत. इमारतींच्या दुरुस्तीच्या पुराव्यावरून इनामगावच्या मध्यवर्ती भागातील घरे कदाचित श्रीमंत व्यक्तींची असतील.
ठिकाणाहून सापडलेल्या काही टेराकोटाच्या वस्तूंना धार्मिक किंवा धार्मिक महत्त्व असल्याचे मानले जाते. इनामगाव आणि नेवासा येथे भाजलेल्या आणि न भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती आढळल्या, ज्या महिलांच्या आकृत्या दर्शवितात असे मानले जाते. नेवासा येथे सापडलेल्या एका उल्लेखनीय आकृतीचा आकार देठासारखा होता, ज्याच्या वरच्या बाजूला डोके दर्शविणारा एक चिमटा होता, छाती दर्शविणारी चिमटा असलेली माती आणि हातांसाठी वक्र आकृत्या होत्या. या व्यतिरिक्त, त्या ठिकाणी बैल, डुक्कर, घोडा आणि घुबड यांच्या मूर्ती सापडल्या. इनामगाव येथे, एका घरात दोन आकृत्या सापडल्या, ज्यांचे स्तन हे एकमेव तपशीलवार शारीरिक वैशिष्ट्ये होती; त्यापैकी एक आकृती एका अंडाकृती पात्रात बसवली होती ज्यावर डोके नसलेली मादी मूर्ती आणि बैल ठेवण्यात आला होता. विद्वानांच्या मते, दोन्ही मादी मूर्ती देवीचे चित्रण मानल्या जाऊ शकतात. डोके नसलेल्या मूर्ती आणि बैलाच्या शरीरावर देखील कोनाडे होते जे एकत्र जोडल्यावर बैलावर बसलेली मूर्ती दर्शवितात.
त्यांनी मुलांसाठी कलश दफन करण्याची पद्धत अवलंबली. प्रौढांना लांब स्थितीत पुरले जात असे आणि त्यांचे पाय घोट्याच्या खाली कापले जात असत, कदाचित व्यक्तीचा आत्मा जिवंत जगात जाऊ नये म्हणून. दफन खड्ड्यांमधून रंगवलेल्या जोर्वे भांड्यांचे पुरावे देखील मिळाले ज्यामध्ये मृतांसाठी अन्न आणि पाणी ठेवले गेले असावे.
सुमारे १००० ईसापूर्व या संस्कृतीचा अचानक ऱ्हास सुरू झाला, जो फक्त इनामगाव येथेच सुरू राहिला, जिथे मातीकाम आणि वस्त्यांमध्ये दर्जा आणि घरांच्या आकारात घसरण झाल्याचे संकेत दिसू लागले. विद्वानांच्या मते, ही घसरण वाढत्या दुष्काळ किंवा दुष्काळासारख्या हवामान घटनेचा परिणाम असू शकते, ज्यामुळे लोकसंख्येचे स्थलांतर झाले असावे. याव्यतिरिक्त, काळ्या आणि लाल भांड्यांच्या उपस्थितीवरून विद्वान दक्षिण दख्खनशी सुमारे ८०० ईसापूर्व संपर्क साधण्याचा सल्ला देतात.
दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३०हेक्टर मोठं होतं आणि
त्याला तटबंदी होती तर
धुळे जिल्ह्यातली कवठे इथली
वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स.
पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन
आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने
अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या
झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit
dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/
साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.
कवठे येथील घर
kaothe.jpg
अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले.
आजवर
अशी १५०हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण
होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्यापैकी मोठी
होती.
कुणी
सांगावं? माझ्या आणि माझ्यासारख्याच आणखी काही वेड्या संशोधकांच्या हाताला
कधीकाळी तरी यश येईल, आणि मधले दुवे जुळवणारे पुरावे सापडतील. इनामगावची
गोष्ट पूर्ण तर केली पहिजे ना.... या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी!! ताजा
कलमः मायबोलीवरच लिहिलेल्या अन्य एका लेखातली माहिती इथे अपडेट करून पुरवणी
जोडते आहे - हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले
आहे.
And the Quest goes on....
जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी !
गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिप्राचीन ठिकाण, येथील संस्कृती, उत्खननात सापडलेली भांडी यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी ग्रामस्थ, अभ्यासक, संशोधक यांची मागणी होती. या साठी १९८२ सालापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु होते. सन १९८४ मध्ये या ठिकाणाला राज्य संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळाला.
पुढे देश विदेशातील हजारो संशोधक या ठिकाणाला भेट देऊन गेले. आता ग्रामस्थांसह सर्वांच्याच मागणीचा विचार करून शासनाने एकछत्र योजनेतून सुमारे साडे सहा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार आणि यापुढे शासनाकडून या ठिकाणास जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी अशी आमची मागणी आहे - तुकाराम मचाले ( इतिहास अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते, इनामगाव )
महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत, शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याची पहिली पद्धत आणि स्वस्तिकचे भांडे हे सर्व सापडले होते इनामगाव येथील उत्खननस्थळी; मात्र सध्या हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या उत्खनन स्थळाला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी इनामगाव ग्रामस्थांनी केली आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
मात्र सध्या गेल्या अनेक वर्षांपासून हे उत्खनन स्थळ शासकीय अनास्थेमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे उगवली आहेत. या ठिकाणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मचाले यांनी संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळावा, तसेच हे स्थळ विकसित करण्यात यावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
वस्तू व अवशेषांचा ब्रिटन येथील प्रदर्शनात सहभाग
इनामगाव येथील उत्खननातील अवशेष व वस्तू डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, अहमदनगर व भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या उत्खननातील वस्तू व अवशेषांचा १९८२ साली ग्रेट ब्रिटन येथे जागतिक प्रदर्शनामध्ये सहभाग होता.
कच्छ मधील धोलावीरा येथील उत्खननात मिळालेले इ.स.पूर्व 1600 मधील वर्तुळाकार आकाराच्या घराचे अवशेष
इनामगाव येथील उत्खननावरून दिसून येते की या स्थानी,इ.स.पूर्व 1600 ते इ.स.पूर्व 700 या कालखंडात सातत्याने मानवी वस्ती होती. त्यामुळे असे म्हणता येते की इ.स.पूर्व 1600च्या सुमारास विलयास गेलेली भारताच्या वायव्य भागातील सिंधू–सरस्वती संस्कृती आणि गौतम बुद्धांचा (इ.स.पूर्व 600) काल यामधील कालखंडाचा इनामगाव हा एक दुवा आहे. आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की मूर्तीपूजक सिंधू–सरस्वती संस्कृतीची जागा,अग्नीपूजक वैदिक संस्कृतीने इ.स.पूर्व 1900 ते इ.स.पूर्व 1600 या कालखंडात निदान उत्तर भारतात तरी घेतली होती. त्यामुळे इनामगाव येथील उत्खनन या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते.
इनामगाव येथील उत्खननात मिळालेले माळवा संस्कृतीकालीन वर्तुळाकार आकाराचे व जमीनीखाली तळ असलेले घर
इनामगाव येथे सापडलेले पूर्व जोरवे संस्कृतीतील चौकोनी आकाराचे व जमीनीखाली तळ असलेले घर
सिंधू–सरस्वती खोर्यांतील जलस्त्रोत जसजसे आटू लागले तेंव्हा येथील रहिवाशांनी पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे स्थलांतर चालू केले. या कालात इनामगाव सारख्या अनेक वस्त्या निर्माण झाल्या असणार. इनामगाव मध्ये मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या, हा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष या ठिकाणी म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. या कालापासून हळूहळू या दोन संस्कृतींमध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू होऊन एक नवे जनुकीय भारतीय मिश्रण तयार झाले व हे मिश्रण इनामगावमधेच बौद्ध कालापर्यंत (इ.स.पूर्व 600) अधिक अधिक दाट होत गेले.
या अहवालामुळे प्रकट झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती वर्ण व्यवस्थेचे प्राबल्य हे इ.स.पहिल्या शतकानंतर भारतामध्ये रूढ झाले. हा शोध दोन कारणांसाठी विलक्षणच म्हणावा लागेल. प्रथम म्हणजे भारतात किंवा उत्तर–वायव्य भारतात तरी वैदिक संस्कृती, साधारणपणे सिंधू–सरस्वती संस्कृती विलयास गेल्यानंतरच, बहरात आली असली तरीही या अहवालाप्रमाणे त्या पुढची 2000 वर्षे तरी चतुर्वर्ण पद्धत भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित नव्हती. दुसरे कारण म्हणजे ज्या धर्माचे सर्व लोकांमधील समानता हे महत्त्वाचे सूत्र होते तो बौद्ध धर्म ऐन बहरात असताना,किंवा इ.स.पहिल्या शतकात,ही चतुर्वर्ण पद्धती संपूर्ण समाजात अतिशय कडक रित्या राबवली जाऊ लागली.
मला हा शोध अतिशय रोचक वाटतो आहे कारण अनेक लोकांची अशी समजूत नव्हे खात्रीच असते की 4000 वर्षे पूर्वी जेंव्हा वैदिक संस्कृती भारतात उदयास आली तेंव्हापासून चतुर्वर्ण पद्धत रूढ झालेली आहे. या अहवालाप्रमाणे ही गोष्ट सत्य नसून प्रत्यक्षात समानतेचा उपदेश करणारा बौद्ध धर्म जेंव्हा सर्वमान्य होता त्या वेळेपासून चतुर्वर्ण पद्धत समाजात रूढ झाली. सारांशाने असे म्हणता येईल की चतुर्वर्ण पद्धत फक्त मागच्या 1900 वर्षांपूर्वी रूढ झालेली आहे.
इनामगाव येथील मानवी वस्ती आणि या सारख्या शेकडो अज्ञात जागा या भारताच्या जनुकीय अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात कारण या अनेक इनामगावांमध्येचएका 2000 वर्षांच्या कालखंडात,खरीखुरी भारतीय व्यक्ती व खरा भारतीय जनुकीय गट,जनुकीय मिश्रणाने निर्माण झाला. यानंतर जातीव्यवस्थेचा किंवा चार्तुवर्ण पद्धतीचा एक मोठाच अडसर या जनुकीय मिश्रणापुढे निर्माण झाला व हे जनुकीय मिश्रण आहे तेथेच गोठून गेले.
मातीच्या भिंती आणि गवताच्या छतांनी बनवलेल्या घरांसह नियोजित वसाहतींचे पुरावे.
गुंतागुंतीची सामाजिक संघटना, कदाचित दफन पद्धती आणि घराच्या आकारांवर आधारित स्थितीतील फरक समाविष्ट करणे.
शेतीचा सराव, प्रामुख्याने बार्ली, गहू, मसूर आणि विविध बाजरी पिकवणे.
जनावरांचे पालन, ज्यामध्ये गायी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरांचा समावेश आहे.
मातीकाम (वेगळी जोर्वे भांडी), मणी बनवणे आणि तांब्याचे काम यासारख्या हस्तकला उपक्रम.
इनामगाव येथील निष्कर्ष पुरातत्वशास्त्रज्ञांना या प्राचीन समुदायांच्या जीवनशैली आणि उपजीविकेच्या पद्धतींची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात.
पर्यायांचे विश्लेषण करणे
इनामगाव जागेच्या संदर्भात दिलेल्या पर्यायांचा विचार करूया:
इंद्रायणी नदी: महाराष्ट्रातील (पुण्याजवळ) एक महत्त्वाची नदी असली तरी, इनामगाव तिच्या काठावर वसलेले नाही.
उल्हास नदी: ही नदी महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातून वाहते, इनामगाव जिथे आहे तिथे नाही.
घोड नदी: इनामगाव हे घोड नदीच्या काठावर वसलेले असल्याचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीयदृष्ट्या दस्तऐवजीकरण केलेले आहे.
कुकडी नदी: ही महाराष्ट्रातील दुसरी नदी आहे, परंतु इनामगाव तिच्या काठावर वसलेले नाही.
पुरातत्वीय शोध आणि भौगोलिक नोंदींनुसार, घोड नदी हीच खरी नदी आहे.
यवतमाळ मध्ये सापडले आरंभीच्या लोहयुगातील वसाहतींचे अवशेष :-
नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या संशोधकांच्या पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड गावात केलेल्या उत्खननात लोहयुगाच्या सुरुवातीच्या सेटलमेंटची माहिती देणारे सांस्कृतिक अवशेष मिळाले आहेत. नागपूरपासून सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या, उत्खनन स्थळाचा शोध लागला, तसेच एक सुव्यवस्थित सांस्कृतिक क्रम, वितळलेल्या जड धातूसाठी चॅनेल किंवा उथळ तव्यासह लोखंड वितळवण्याची भट्टी सापडली आहे.
यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील पाचखेडा येथे पुरातत्व विभागाच्या वतीने उत्खनन सुरू आहे. पाचखेडा येथील उत्खननात सातवाहन काळाच्या खुणा सापडल्या आहेत. पाचखेडा हे गाव दोन नद्यांच्या संगमापासून एक किलोमीटर अंतरावर आहे.
दक्षिण पूर्वेस चंद्रभागा नदीच्या डाव्या तीरावर हे गाव वसलेले आहे. पुलगाव बाभुळगांव रस्त्यावर सिंधी गावाच्या पूर्वेस तीन किमी आणि यवतमाळ शहरापासून 43 किमी अंतरावर सदर गाव आहेत. या वस्तीच्या पुरास्थळीला स्थानिक पातळीवर सासु सुनेचे उखाडे आणि बरड म्हणून ओळखले जाते पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी उत्खनन सुरू केले आहेत.
सातवाहन काळातील व्यापारी मार्गावर असलेल्या या स्थळाचे पुरातत्वीय महत्त्व लक्षात घेऊन उत्खनन सुरू आहेत. येथे सातवाहन कालीन विहिर देखील आढळून आल्यात. तसेच अनेक खापरी, मडकी भांडी आढळली आहेत. उत्खननात पुढे आणखी कोणत्या पुरातन गोष्टीचा उलगाडा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत
https://www.maayboli.com/node/69679
उदक राखिले युक्तीने - दख्खनच्या आद्य कालव्याची गोष्ट
(भवताल नामक पर्यावरणविषयक जागृती करणार्या संस्थेतर्फे दरवर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित होतो. २०१८ च्या दिवाळी विशेषांकाचा विषय पारंपरिक जलसंधारण पद्धती हा होता. अंकाचे नाव 'उदक राखिले युक्तीने' (संपादक; अभिजित घोरपडे). त्यात प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची असंपादित/ संपादकीय काटछाट न केलेली आवृत्ती इथे पुनर्प्रकाशित करत आहे)
एक ओकंबोकं गाव आहे... उजाड आहे... वैराण आहे... गावाचं नाव इनामगाव. खरंतर या गावाचं मूळ नाव काय हे कुणालाच कधीच ठाऊक नाहीये. शेजारच्या इनामगावच्या शिवाराच्या हद्दीत येतं म्हणून याचंही नाव इनामगावच. पण हे गाव नेहेमीच असं उजाड ओसाड नव्हतं. खूप खूप शतकांपूर्वी, काही सहस्रकांपूर्वी इथे एक नांदतंजागतं नदीकाठाच्या आसर्याने राहणारं गाव होतं. तर त्या गावाची ही कहाणी. महाराष्ट्रातल्या, दख्खनमधल्या पहिल्यावहिल्या ज्ञात जलसंधारण तंत्रज्ञानाची कहाणी.
लिखित इतिहासकालापेक्षाही प्राचीन अशा त्या दख्खनच्या आद्य शेतकरी समाजाने मागे सोडलेल्या गावांची, वाड्या-वस्त्यांची ओळख पटवणार्या पांढरीच्या - खापरांच्या पाउलखुणा पश्चिम दख्खनमध्ये अनेको ठिकाणी उमटलेल्या दिसतात. जवळजवळ दोनशेहून अधिक वसाहतींची पुरातत्वाने आजवर नोंद केलेली आहे. १९४७ साली प्रथम प्रकाशात आलेल्या प्रवराकाठच्या जोर्वे गावच्या उत्खननापासून ते थेट अगदी अलिकडे सांगली जिल्ह्यात चिकुर्डे मध्ये झालेल्या सर्वेक्षणापर्यंत सुमारे पासष्ट सत्तर वर्षे सतत या वसाहतींवर, कालखंडावर अनेक अभ्यासकांनी संशोधन केले आहे. वीसपेक्षा जास्त ठिकाणी उत्खनने झालेली आहेत. त्यामुळे एकूणच या समाजाच्या, कालंखंडाच्या जीवनपद्धतीविषयी आपल्याला बर्यापैकी सखोल माहिती मिळालेली आहे. या माहितीत सगळ्यात मोलाची भर टाकली ती इनामगाव येथील सतत १३ वर्षे चाललेल्या उत्खननाने आणि त्याच बरोबर दायमाबाद, प्रकाश, कवठे, वाळकी आणि अशाच इतर छोट्यामोठ्या उत्खननांनी.
कसं होतं हे दख्खनमधल्या आद्य शेतकर्याचं जीवन? सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याला या दख्खनच्या आद्य वसाहती आढळायला लागतात. सुरुवातीला बहुदा हंगामीच असणारी छोटी छोटी गावं, वाड्या पुढच्या हजार वर्षांत व्यवस्थित स्थिरावतात. पूर्ण दख्खनभर अशी अनेक स्थायी गावे, त्यांना संलग्न/ स्वतंत्र अशा हंगामी वाड्या-वस्त्या पसरलेल्या होत्या असे दिसते. नदीनाल्यांच्या काठाला, काळ्याकरंद सुपीक जमिनीच्या सान्निध्यात, चराऊ कुरणांच्या जवळपास, कधीतरी गारगोटीचे दगड जिथे विपुल प्रमाणात मिळतात त्या ठिकाणाच्या आसपास अशा विविध प्रकारच्या परिसरांमध्ये या लोकसमूहांचा वावर होता. पण दख्खनचे पर्यावरण, पाऊसमान तेव्हाही आजपेक्षा फार वेगळे नव्हते. तेव्हाही दख्खन अर्धदुष्काळीच होता. त्यामुळे बहुतेक गावं वसवताना साहजिकपणेच जलस्रोतांशी सान्निध्य हा एक महत्वाचा निकष होता असे दिसून येते. लोखंड गाळायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. तांबे आणि दगड यांची हत्यारं औजारं वापरली जात असत. म्हणूनच त्यांना पुरातत्वात ताम्रपाषाण युग असे म्हणले जाते. शेती, पशुपालन, शिकार, मासेमारी, जंगलातून फळे कंदमुळे इत्यादि गोळा करणे यावर या समाजांची उपजीविका होत असे. आपसात देवाणघेवाणही होतच असे. पार कर्नाटक आणि गुजरात राजस्थानपर्यंतच्या प्रदेशांशी यांचे देवाणघेवाणीतून संपर्क होते. मात्र नाणी नव्हती, चलनव्यवस्था नव्हती, शहरे नव्हती, राजसत्तेची चौकट नव्हती आणि बांधीव शासनयंत्रणाही नव्हती. फक्त कुटु़ंब आणि कुल यांच्या चौकटीत वावरणारे हे समाजगट होते आणि आपसातच गावप्रमुखांद्वारे कारभार चालत असे.
असे असले तरीही या गावांचीही आपसात एक उतरंडीची व्यवस्था असावी असा संशोधकांचा कयास आहे. म्हणजे काही मोठी गावे प्रादेशिक केंद्रे आणि पर्यायाने त्या त्या प्रदेशातील गावांच्या सामाजिक-आर्थिक-धार्मिक जीवनाचे केंद्र असावीत असे दिसते. ही गावे म्हणजे तापी खोर्यातील प्रकाश, गोदावरी-प्रवरा खोर्यातील दायमाबाद आणि भीमा खोर्यातील इनामगाव.
भीमेची उपनदी घोड. अगदीच तीव्र उन्हाळा सोडला तर एरवी बर्यापैकी पाणी असणारी. तिच्या एका वळणावर इनामगाव वसले आहे. पांढरीचा एकूण परिसर पंचवीस एकरांच्या आसपास. इ.स.पू. १६००च्या सुमारास इथे प्रथम माणसं कायमस्वरूपी वस्तीला आली असे दिसते. ते थेट पुढची जवळपास हजार वर्षे. किती पिढ्या आणि जीवनाच्या नदीची किती वळणे गावाने बघितली असतील ते फक्त त्या पांढरीलाच ठाऊक. आपल्याला माहित ते फक्त त्यांच्या घरांबद्दल, कारागिरीबद्दल, भांड्याकुंड्यांबद्दल; कुठली धान्ये पिकत, कुठले प्राणी पाळत, कुठली शिकार करत यांबद्दल. पुरातत्वीय तांत्रिक परिभाषेत त्याचे तीन सांस्कृतिक उपकालखंड पडतात - माळवा, पूर्व-जोर्वे आणि उत्तर-जोर्वे कालखंड. त्यातील पूर्व-जोर्वे कालखंड हा सगळ्यात भरभराटीचा सुबत्तेचा होता. थोडक्यात आढावा घ्यायचा तर कुडांच्या एक-दोन-तीन खोल्यांच्या अंगण असलेल्या घरात राहणारी ही कुटुंबे गाई-बैलांची-म्हशींची खिल्लारं आणि शेळ्या-मेंढ्यांचे कळप राखत. त्याचबरोबर डुकरं, कोंबडी, कुत्री असेही प्राणी गावात असत. दख्खनच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पीकपद्धतीचा उगम याच काळात झाला असे दिसते. जव (बार्ली), गहू, मूग, मसूर, तूर, उडीद, हरभरा, कुळीथ, वाटाणा, राळे, नाचणी अशी अशी खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिके इथे घेतली जात असत असे पुरावे सांगतात.
इनामगाव शिरूरच्या जवळ आहे. दख्खनच्या अर्धदुष्काळी पट्ट्याच्या अगदी मध्यभागी. वर्षात जेमतेम ५०० मिमि पाऊस पडतो. तोही बेभरवशी. राजस्थानमधून मिळालेले पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला असे सांगतात की त्याकाळी पश्चिम भारतात थोडा जास्त पाऊस पडत असे. पाऊसपाणी नियमित असे. अशा अनुकूल पाऊसमानामुळेच या ताम्रपाषाणयुगीन वसाहती दख्खनच्या पठारावर सर्वत्र स्थिरावू शकल्या असे संशोधकांचे अनुमान आहे. प्राचीन काळापासून नदीच्या वळणावर गावं वसवली जातात कारण अशा ठिकाणी सहसा डोह तयार होतो आणि उन्हाळ्यात इतर पाणी आटलं तरी डोह मात्र गरजेपुरतं पाणी साठवून ठेवतो. इनामगाव वसवायच्या मागेही तिथली काळी सुपीक जमीन आणि नदीचं वाकण हेच महत्वाचं ठरलेलं असणार.
मात्र इतक्या मोठ्या गावाला अर्धदुष्काळी हवामानात बेतास बात पाऊसपाण्यात तगून राहायचे असेल तर नैसर्गिक संसाधने व त्यांचे स्रोत यांचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागते. विशेषतः भक्कम पाठिंबा देऊ शकणारी शहरे आणि महाप्रादेशिक शासनयंत्रणा अस्तित्वातच नसताना. अशा अर्धदुष्काळी प्रदेशांत राहणार्या प्राचीन समाजांचा अभ्यास करणार्या संशोधकांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुविहित शासनयंत्रणेचा अभाव असताना आदिम लोकसमूह संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी विविध प्रकारची सांस्कृतिक धोरणे अवलंबतात. त्यात प्रामुख्याने उपजीविकेच्या मार्गांचे वैविध्य, साठवणूक, भटकंती (म्हणजे काही काळ दुसरी कडे जाऊन तिथली संसाधने वापरायची, एकाच ठिकाणच्या संसाधनांवर सतत ताण पडत नाही) आणि अन्य लोकसमूहांशी देवाणघेवाण यांचा समावेश होतो. इनामगावच्या पुराव्याकडे बघता हे चारही मार्ग इथल्या गावकर्यांनी वर्षानुवर्षे चोखाळले होते हे उघड आहे. विविध समकालीन लोकसमूहांशी देवाणघेवाणीचे संपर्क आणि उपजीविकेचे वैविध्य वरती नमूद केलेच आहे. त्या शिवाय धान्याच्या साठवणुकीसाठी मोठाल्या कणग्या, रांजण घरोघरी वापरले जात. एवढेच नव्हे तर गावाचे मिळून सार्वजनिक धान्याचे कोठारही होते आणि गावचा प्रमुख बहुदा त्याची निगराणी करत असे असेही उत्खनित पुराव्यांवरून दिसून आले आहे. शिवाय इनामगावचे काही गावकरी नियमितपणे तिथून ३२ किमी दूर असलेल्या वाळकी गावानजिक असलेल्या अतिशय सुपीक अशा जमिनीच्या पट्ट्यावर शेती करायला जात व हंगामी वस्ती करून राहात हेही वाळकी येथील उत्खननातून सिद्ध झालेले आहे.
हे सगळे खरे असले, आणि इनामगाव अर्धदुष्काळी पट्ट्यातील अगदी 'क्लासिक' असे आदिम गावाचे उदाहरण म्हणून ढळढळीत दिसत असले तरीही या सगळ्या पुराव्यांमध्ये एक थोडा विसंगत पुरावा मिळत होता. तो म्हणजे गहू. इनामगावच्या उत्खननात तांदूळ आणि वालही मिळाले होते. पण अगदीच थोडक्या प्रमाणात. त्यामुळे ते बाहेरून, जास्त पावसाच्या प्रदेशात असलेल्या गावांतून आयात केले गेले असणार, असा अंदाज सहजच बांधता येत होता. पूर्व-जोर्वे काळात गहू मात्र इथेच पिकवले जात असणार असे पुरावा सांगत होता. गहू हे रब्बी पीक आणि त्याला भरपूर पाणी लागतं, सिंचनाची व्यवस्था लागते. दख्खनमध्ये गहू होतो, पण या शिरूर-दौंडच्या पट्ट्यात कधीच नाही. तिकडे कोपरगाव परिसरात (जिथून दायमाबाद हे ताम्रपाषणयुगीन स्थळ अगदीच जवळ आहे) उत्तम काळी माती, भरपूर पाऊस म्हणून पारंपरिकरीत्या खपली, बक्षी गहू वगैरे होत असे कलोनियल रेकॉर्ड्स आपल्याला सांगतात. पण इनामगावच्या आसपास मात्र कधीच गहू झाल्याचं ऐकिवात नाही. मग इथे गहू कसा काय होत होता?
पाण्याची साठवणूक किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन याविषयी ताम्रपाषाणयुगीन वसाहतींमधून जवळजवळ काहीच पुरावा तोपर्यंत उपलब्ध नव्हता. रोजच्या वापराचे पाणी साठवण्यासाठी असलेले मोठे मोठे रांजण - जे अजूनही खेडेगावांमध्ये वापरले जातात - अनेको मिळाले होते पण त्याचा वापर हा शेतीसाठी निश्चितच होत नसणार. बरं, लोहतंत्रज्ञान अवगत नसल्याने जलसंधारण करण्यासाठी विहिरी अस्तित्वात नव्हत्या हेही उघड आहे. काळा फत्तर पहारीशिवाय कसा फोडणार? अशा विहिरी सिंधू संस्कृतीत मिळाल्या आहेत, पण तो दगडाशिवायचा नदीच्या गाळाचा मऊ मातीच प्रदेश! शिवाय दख्खनमध्ये इतक्या आधी नदीवर बांध बांधल्याचे अवशेष/पुरावे अजूनतरी उघडकीला आलेले नाहीत. तेव्हा तिथे होणारे गव्हाचे पीक हे काही काळ तरी उत्खनकांना पडलेले कोडेच होते. ते उलगडले पुढच्या काही वर्षांमधे मिळालेल्या रोचक पुराव्यांनी.
गावाच्या बाहेर काही अंतरावर दगडांचे ढिगारे उत्खनकांनी बघितले होते, ते नक्की कशाचे आहेत ते बघायला त्यांनी तिथे पद्धतशीर चाचणी उत्खनन केले. त्यातून लक्षात आले की ते गावाभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आहेत. तब्बल २४० मीटर म्हणजेच जवळपास ८०० फूट लांबीची आणि दहा फूट जाडीची ती भिंत होती. एवढेच नव्हे तर या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला जवळपास समांतर असे एक ओढ्याचे/नाल्याचे पात्र असावे असा पुरावा मिळत होता. गावपरिसराच्या सम्यक भूगोलाचा विचार करताना दिसून आले की लांब गावाच्या पूर्वेला नदी आणि उत्तरेला एक छोटा नाला आहे. आणि हे पात्र त्या उत्तरेच्या नाल्याला मिळत असणार. तसेच हे नैसर्गिक जलौघाचे पात्र नाही. एकुणात पुरावा दर्शवतो की हा मुद्दाम खणलेला कालवा आहे. जवळजवळ २८ ते ३० फूट रुंद आणि साडेतीनशे फुटापेक्षा लांब असा तो कालवा होता. शिवाय त्याचा मध्यभाग आणखी खोलगट केलेला होता. अभ्यासकांच्या मते या कालव्याची किमान संधारण क्षमता सुमारे ५४००० घनफूट पाणी साठवणुकीची होती.
घोडनदीला दरवर्षी येणारा पूर बघता उत्खनकांनी असे अनुमान केले आहे की दरवर्षीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी तो कालवा खोदून पुराचे अतिरिक्त पाणी त्यात वळवले जात असणार. आणि म्हणूनच कालवा आणि गावाच्या मध्ये दगडी भिंत बांधली गेली. या कालव्याने दोन उद्दिष्टे साध्य होत होती. एक म्हणजे पुराच्या अतिरिक्त लोंढ्याला वाट देऊन गावाच्या संरक्षणाला हातभार लावणे आणि दुसरे म्हणजे थोड्या खोलगट परिसरात असल्याने हे पावसाळ्यात जमलेले पाणी त्यानंतर काही महिने तिथे साठून राहात असणार. साहजिकच विहिरीशिवायची भरवशाची पाण्याची साठवणूक म्हणून या कालव्याचा उपयोग गावकरी करत असणार. कालवा आणि भिंतीमध्ये मिळालेल्या खापरांच्या आधारे याचा काळ पूर्व-जोर्वे कालखंड (इ.स.पू. १४००-१०००) असा निश्चित करण्यात आला.
या काळात पाऊसमान सर्वात जास्त चांगले होते असे पुरापर्यावरणीय पुरावे सांगतात. तेव्हा उत्तम पाऊसमान आणि कालव्याचे पाणी याच्याच मदतीने इनामगावच्या शिवारांमध्ये गव्हाची लागवड होत असणार हे उघड आहे. तलाव, विहिरी, कुंडे इत्यादि गावपातळीवरील जलव्यवस्थापनाचे मार्ग या गावांना लोहतंत्रज्ञानाच्या अभावी शक्य नव्हते. नागरी सिंधू संस्कृती सोडता तत्कालिन कुठल्याच समाजात ही जलसंधारण तंत्रे आढळत नाहीत. गुजरातेत साबरमतीच्या खोर्यातील तिंबर्वा, धाटवा, जोखा अशी काही ताम्रपाषाणयुगीन गावे आसपास असलेल्या खोलगट घळींमध्ये साठलेले पाणी वापरत असल्याचे अनुमान संशोधकांनी मांडले आहे. परंतु ते पूर्णपणे नैसर्गिक असे हंगामी जलस्रोत आहेत. त्या दृष्टीने इनामगावचा कालवा हे अतिशय दुर्मिळ, कदाचित एकुलते एक, असे आद्य शेतकरी समूहांच्या जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरते.
हे समाजसमूह राजसत्तेने नियंत्रित नव्हते तर ज्याला मानववंशशास्त्रात चीफडम (chiefdom) म्हणतात तसे, गावप्रमुखांच्या आधिपत्याखाली सहकारी तत्वाने जगणारे समूह होते. जन्माधारित सामाजिक भेदाभेदही इथे असल्याचा पुरावा नाही. तेव्हा अशी सार्वजनिक पातळीवरची कामे ही गावप्रमुखाने केलेल्या नियोजनावर आधारित पूर्णपणे सहकारी तत्वावर पार पाडली गेली असणार हे उघड आहे. दख्खनमधील ही आद्य पाणी-पंचायत मानायला हरकत नसावी. अशा व्यवस्था कदाचित इतरही समकालीन वसाहतींमध्ये असू शकतील, परंतु आपल्याला तसे पुरावे मिळालेले नाहीत.
मात्र इ.स.पू १००० पासून, उत्तर जोर्वे कालखंडापासून पाऊसमान बेभरवशी झालेले दिसून येते. दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढायला लागली. गाळ साठून आणि अपुर्या पावसाने या कालव्याचा वापर थांबलेला दिसतो. हळूहळू तो बुजून गेला. गव्हाची लागवड आता कुणी करेनासे झाले. नाचणीसारख्या कमी पाण्याच्या पिकांवर आणि काळविटांच्या शिकारीवर भर वाढायला लागला. हळूहळू शेतीचे प्रमाण कमी होऊन पशुपालनावर गाव जास्त विसंबून राहू लागले आणि मग पाण्याच्या शोधात, चराऊ कुरणांच्या शोधात गावाबाहेर पडून अर्धभटके जीवन जगायला लागले. गाव जगायला बाहेर पडलं आणि संस्कृतीचे चक्र 'उलटे' फिरून परत एकदा भटके जीवन समाजाने स्वीकारले.
प्रतिसादांबाबत सगळ्यांना धन्यवाद.
@ ShashankP - इनामगावची पांढर आजही अस्तित्वात आहे, तिथे जायला कुणालाच मज्जाव नाही. पण तिथे आता उत्खननाच्या खुणा शिल्लक नाहीत. फक्त वरती खापरे व इतर पुरावशेष मिळतात. इनामगाव उत्खननातून मिळालेले सर्व महत्वाचे पुरावशेष पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वस्तुसंग्रहालयात बघायला मिळतील. @ चिडकू - तुमच्या माहितीबद्दल फार आभारी आहे. याचाच अर्थ हे तंत्रज्ञान गेले साडेतीन हजार वर्षे दख्खनमध्ये वापरले जात होते. परंतू त्याची जाणतेपणाने नोंद घेतली गेली तर नाहीच पण राजस्थानात जसे जोहडवर काम झाले तशा पद्धतीने या व्यवस्थांचे पुनरुज्जीवनही झाले नाहीये. महाराष्ट्रात ज्या काही छोट्यामोठ्या स्थानिक पारंपरिक जलसंधारण पद्धती होत्या त्याचं डॉक्युमेन्टेशन व्हायची फार गरज आहे. भवताल ही संस्था सध्या हे काम करत आहे. जर या भागात अशी व्यवस्था अजूनही कुठे शिल्लक असेल तर तुम्ही त्यांना फेसबुकवर कळवू शकाल. @आशुचॅम्प, लसावि - फोटो उत्खनन अहवालात आहेत पण काळे पांढरे आहेत आणि त्यातून काहीही बोध होण्यासारखा नाहीए - फक्त दगड आणि माती दिसत आहेत - एक आरेखन आहे माझ्याकडे कुठेतरी पण आत्ता सापडत नाहीये. उत्खनन अहवालात जो आरेखन नकाशा आहे तो जमलं तर इथे टाकेन - त्यात थोडा अंदाज येईल @हीरा - घडीव, चिर्याचे दगड अर्थातच वापरले नव्हते. कारण लोखंडी औजारे उपलब्ध नव्हती. एरवीचे दगडच मातीचं/चिखलाचं लिंपण करून बसवले होते. चुना त्यांना माहित होता, इनामगावात चुन्याचे उत्पादन करणारे लोणारीही होते असं पुरावा आपल्याला सांगतो पण या बांधकामात चुना वापरलेला आढळून आलेला नाहीये. ते शेततळे नक्की नव्हते. कालवाच होता. बर्याच अंतरा पर्यंत ट्रेस केला गेला आहे. खणाखणी अर्थातच कठीण टोकेरी दगडी हत्यारांनी झालेली असणार
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे यात सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी. आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४ दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं. चूल म्हणजे काही वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा, त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्याही इंधन म्हणून यात स्वाहा होत. एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या (तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू, गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी, लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात. (या लेखाच्या प्रारंभालाच इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अॅन्टेलोप काढलेलंही स्पष्ट दिसत आहे)रोजची औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्हाडी, गारगोटीचे छिलके काढून तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार व्हायची!), तांब्याच्या कुर्हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय! लोक कपडेबिपडे घालत होते की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या 'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात. भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी अॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक, लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी उत्खननांमधून मिळालेत. उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging) असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत. आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं, तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती. शेतीसाठी वापरात आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill (याला मराठीत काय म्हणतात बरं?) यांचा समावेश आहे.
पाळीव प्राण्यांमधे गाय-बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, गाढवं, कोंबड्या, डुकरं, आणि कुत्री, मांजरं यांचा पुरावा आढळतो. घोडा आढळतो पण तो अगदी शेवटच्या कालखंडात (बहुदा दक्षिण भारतातल्या लोहयुगीन लोकांच्या संपर्कामुळे). शिकार करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर, कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक, खेकडे, मासे, इ. या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच. याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे, शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो. या सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच बनवत. हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती. इनामगावच्या उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे ६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं! आणि इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर शुद्ध रस खापराच्या मुशीत! एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते. या परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:- तांबे (राजस्थान/गुजरात); शंख (गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अॅमेझोनईट हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ. दळणवळणाची साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर! शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात. रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र हे झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून (इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही). हे लोक मृतांचे दफन करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult) व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात. शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत. बाकी त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही. पण विविध प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात. तेव्हा स्त्रीतत्त्वाची/ सुफलनाची संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल नाही. शिवाय गुजरात, राजस्थान, माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात. बैल कदाचित पुरुषतत्त्वाशी, शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा. इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली. ही निश्चितच कुठल्यातरी धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून गेला आहे. याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग एका वन्य प्राण्याचा (बहुदा बिबळ्या) अशीही एक आकृती आढळते. याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे. अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत. हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात). हे असे समाज भारतात इतर प्रदेशातही होते. हळूहळू यांना लोहतंत्रज्ञानाचा शोध लागला आणि इ.स. पूर्व ५-६व्या शतकानंतर येणार्या शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसते. अगदी विदर्भातही असाच सांस्कृतिक कालानुक्रम आढळतो. पण दख्खनच्या पठारावर मात्र काही वेगळंच घडलं! इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला. अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल! इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे. या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले. आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले. इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची. इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढे आणखी ४००-५०० वर्षे कुठल्याही वसाहतींचा पुरावा आपल्याला अजून मिळत नाही. मग एकदम सातवाहन कालाच्या थोडं आधीपासून परत एकदा सगळीकडे गावं वसलेली दिसतात. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो. या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे. कुणी सांगावं? माझ्या आणि माझ्यासारख्याच आणखी काही वेड्या संशोधकांच्या हाताला कधीकाळी तरी यश येईल, आणि मधले दुवे जुळवणारे पुरावे सापडतील. इनामगावची गोष्ट पूर्ण तर केली पहिजे ना.... या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी!! ताजा कलमः मायबोलीवरच लिहिलेल्या अन्य एका लेखातली माहिती इथे अपडेट करून पुरवणी जोडते आहे - भीमेच्या खोर्यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले आहे. And the Quest goes on.... संदर्भः वरील लेखात उल्लेखलेल्या सर्व पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन अहवाल नकाशे आणी प्रकाशचित्रे -उत्खनन अहवाल व 'First Farmers of the Deccan' - M. K. Dhavalikar
Maharashtra: '2,000-year-old Sangli labyrinth to be conserved'
Rahul Gayakwad
~2 minutes
The site of stone labyrinths, which illustrates the footsteps of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka. Photo: Rahul Gayakwad/TOI
SANGLI: Guardian minister of Sangli Jayant Patil visited the site of ancient labyrinth in Walva taluka, of Sangli district, and assured that its conservation would be done through the state archaeology department, in coordination with Archaeological Survey of India (ASI). MLA Mansing Naik was also present. Patil said: "These stone labyrinths illustrate the existence of ancient Indo-Roman culture at Aitawde Budruk in Walva taluka." According to the archaeological study presented by Sachin Patil, foreign trade had been taking place in this area even in the third century BC.
It is also evident that Greco-Roman merchants came here and the symbol on their coins and the layout of this stone labyrinth is similar. "There are historical references to the arrival of foreign traders in Kolhapur, Karad and Ter in western Maharashtra. The state is ready to help in the conservation of all the newly discovered ancient heritage sites and such symbols in Maharashtra," added Jayant Patil.
Head of archaeological department at the Deccan College Research Institute and Deemed University in Pune, Dr P D Sabale, said, "More labyrinths are expected to be there in Shahuwadi, Radhanagari, Bhudargad and Gaganbawda region and if people come across such rare stone formations, then they should preserve them for further research. These labyrinths in Sangli still are rarely explored and await proper conservation as per the archaeological norms."
Day 166: June 15 In The Year of Living Honestly In The Quarter of: Education In The Month of: Exploration
The 2,500 year old labyrinth of Horus in the Krishnagiri District of Southern India. Photo Credits: Times of India
Estimated at being 2,500 years old, the discovery of a circular labyrinth was made only a year before of an ancient labyrinth design by two researchers that was observed in our exploration for yesterday. This design may be 500 years older and sits at approximately 700 square feet in area, making it another megalithic reward.
This labyrinth is located only two hours north of the other ancient labyrinth in the forested town of Horus in the Krishnagiri district of Southern India. It is a place where gardens are not overrun by rabbits, but trampled annually by elephants to give some perspective of the area and Indian culture.
This circle of stones was found in a simple and obscure community used unknowingly in ceremony and ritual by its members adopting it in a prayerful way and adding it to their way of life. Its natural wonder and wisdom must have appealed to the community to simply adjust by using it and thereby gaining in understanding rather than clearing it in the name of progress. The labyrinth existed before any of its inhabitants giving it a sense of greater appreciation and respect perhaps.
क न सुटलेलं कोड आणि महाभारत चक्रव्यूह (कोड्याचं माळ , योगेवाडी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )
जगातील एक मोठं महाकाव्य म्हणून महाभारत प्रसिद्ध आहे. भारतीय समाजाचे आर्थिक, सामाजिक , राजकीय , कौटुंबिक प्रतिबिंब आपल्याला त्यामध्ये दिसते . आजही आपल्या देशात , समाजात त्याच्या खाणाखुणा दिसतात .
त्यातील माझ्या गावाजवळच्या एका गोष्टीचा संबंध गेल्या काही दिवसापूर्वी आला . योगेवाडी जवळचे कोड्याचे माळ . आजवर अनेक दंतकथा या माळाबद्द्दल व तेथील कोडयाबद्द्दल ऐकलेल्या आहेत . जसेकी कलावंतीण बाईचे कोडे , राक्षसाचा खेळ इत्यादी . पण थोडीफार मनाला पटलेली माहिती गेल्या काही दिवसापूर्वी मिळाली .
महाभारतातील कुरुक्षेत्र युद्ध आणि अभिमन्यू वध आपणाला माहीतच आहे . युद्धाच्या त्या दिवशी द्रोणाचार्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये 'चक्रव्यूह ' रचना केली होती आणि अभिमन्यू त्यामध्ये मारला गेला . त्याला आत जायचा कसा हे माहित होत पण बाहेर पडायचं कसा हे माहित नव्हता आणि पुढची स्टोरी तुम्हाला माहितीच असेल .
तर मुख्य मुद्दा त्या चक्रव्यूह रचनेचा , ती रचना तेंव्हा आणि त्यानंतर भारतात , भारतीय समाजात , संस्कृतीमध्ये खूप रुजली . लोकांनी चित्र काढण्यासाठी , रांगोळी , भिंती रंगवणे , कपड्यावरचे नक्षी यामध्ये त्या रचनेचा उपयोग केला . आजही उत्तर भारतात जुन्या मंदिरामध्ये दगडावर कोरलेली , जुन्या भिंती चित्रात दिसते .
आणि आपल्या कोड्याच्या माळावरचे ते रचनाकार ठेवलेले दगड हे ती चक्रव्यूह रचनाच आहे , याची रचना मध्ययुगीन भारतात झाली असावी . तेंव्हा सिनेमा , TV , मोबाईल वगैरे काही नव्हते त्यामुळे करमणुकीच्या हेतूने याचा उपयोग केला असावा .
आज याठिकाणी tourism साठी चांगला वाव आहे . शेजारी मणेराजुरी मोठा तलाव हि आहे जो इथल्या निसर्ग सौन्दर्यात अजून भर टाकतो योग्य नियोजन केले तर लोकांना १ day trip पण होईल आणि ग्रामपंचायतीला चांगला महसूल हि भेटेल .
कोणत्याही गोष्टीत अडकणे सोपं पण बाहेर पडणं खूप अवघड . ती रचना आणि चक्रव्यूह आपणाला तेच शिकवते . बाहेर आता आलं पाहिजे अडचणी असो वा संकट तरच अर्जुन बनता येईल . त्यासाठी श्री कृष्णासारखा सारथी मार्गदर्शक पण आपल्याला नेहमी जवळ ठेवावा लागेल .
ठिकाण -
कोड्याचे माळ
(योगेवाडी / मणेराजुरी , तालुका - तासगाव , जिल्हा - सांगली )
मेगालिथिक भौतिक संस्कृतीवर विपुल साहित्य असूनही, पर्यावरणीय आणि पद्धतशीर चौकटीविरुद्ध डेटा एकत्रित करण्यासाठी आतापर्यंत कोणतेही व्यापक प्रयत्न केले गेले नाहीत. पूर्वीच्या संशोधकांचे प्राधान्यक्रम आणि दृष्टिकोन वेगळे असले तरी, त्यांनी त्यांचे बरेचसे प्रयत्न संस्कृती इतिहासाच्या पुनर्बांधणीसाठी समर्पित केले. मेगालिथिक उत्पादन पद्धती, उत्पादन संबंध , सामाजिक भेदभावाचे पैलू आणि सामाजिक संघटना यांच्याशी संबंधित जटिल प्रश्न मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहिले.
तथापि, मेगालिथिक काळातील भौतिक डेटाचे अलिकडच्या परिमाणात्मक मूल्यांकन, तसेच पर्यावरणीय आणि पद्धतशीर चौकटीच्या तुलनेत त्याचे एकत्रीकरण, असे दर्शविते की उत्पादनाच्या सामाजिक स्तरावर विशेष धोरणे, म्हणजेच शेती आणि पशुपालन यांचे संयोजन स्वीकारले गेले. वर्धा-पेनगंगा मैदान, वैनगंगा खोरे, मध्य कृष्णा खोरे, रायलसीमा पठार, दक्षिण आंध्र घाट, धारवाड पठार, बंगळुरू प्रदेश, म्हैसूर प्रदेश, दक्षिण मलनाड, मेत्तूर-वेल्लोर प्रदेश, कोइम्बतूर उंच प्रदेश, पालार-पोन्नैयार खोरे, वैगई-तांबरापरानी खोरे आणि दक्षिण मलबार या भौगोलिक झोनमध्ये स्थित मेगालिथिक स्थळे निर्विवादपणे या निर्वाह धोरणांना सूचित करतात. येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की त्यांच्या वसाहतीची बहुतेक ठिकाणे प्रमुख नद्यांच्या काठावर किंवा त्यांच्या प्रमुख उपनद्यांवर आहेत आणि बहुतेक दफन स्थळे प्रमुख जलसंपत्तीपासून 10-20 किमी अंतरावर आहेत. या निर्वाह धोरणाचे संकेत पुढील तथ्ये देखील देऊ शकतात: (१) नदीच्या खोऱ्या आणि खोऱ्यांमध्ये त्यांच्या जागांचे जास्तीत जास्त प्रमाण आणि काळी माती आणि लाल वाळू-चिकट मातीच्या झोनमध्ये व्यापण्यास दाखवलेले प्राधान्य; (२) पर्जन्यमान झोनमध्ये या जागांचे वितरण स्वरूप जेथे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६०० ते १५०० मिमी पर्यंत असते; तसेच (३) मुख्यतः उष्णकटिबंधीय कोरडे पानझडी, उष्णकटिबंधीय काटेरी आणि उष्णकटिबंधीय ओलसर पानझडी वन झोनमध्ये त्यांच्या जागांची जास्तीत जास्त संख्या इतर दाट वन झोनप्रमाणे टाळणे.
तथापि, नैऋत्य आंध्र प्रदेश, वायव्य कर्नाटक आणि तेलंगणा, रायलसीमा पेनेप्लेन, दक्षिण आंध्र घाट आणि उत्तर मैदान या वायव्य आंध्र प्रदेशांमध्ये कुरुव (जे प्रामुख्याने मेंढ्या/शेळ्या पाळणारे आहेत) आणि गोल्ला (जे प्रामुख्याने गुरे पाळणारे आहेत परंतु कमी संख्येने मेंढ्या/शेळ्या पाळतात) यांच्या सध्याच्या वितरणात दिसून येणारे पशुपालन परंपरांचे प्राबल्य हे पशुपालन निर्वाह धोरणाकडे जास्त कल दर्शवू शकते. हे पर्यावरणीय ताण आणि या निर्वाह धोरणाद्वारे प्रदान केलेल्या मोठ्या आर्थिक फायद्यांमुळे असू शकते. जरी या प्रदेशांमध्ये पशुपालनाचे खूप मजबूत पुरावे असले तरी, सध्या मेंढ्या/शेळ्या पाळण्याबाबत पुरातत्वीय पुराव्यांमध्ये अभाव आहे. ही कमतरता प्रामुख्याने पुरावे शोधण्यासाठी प्रयत्नांच्या अभावामुळे असल्याचे दिसते. तथापि, हे एक कार्यरत गृहीतक म्हणून घेतले जाऊ शकते आणि भविष्यातील तपासांनी त्यांचा शोध घेतला पाहिजे. तरीही, हे उपरोक्त भिन्न आर्थिक नमुने, जे तेव्हा प्रचलित होते, जसे की आताही आहे, वेगळे नव्हते परंतु एकमेकांशी सहजीवन संबंध होते.
Their subsistence base was a specialized agropastoral economy dominated by cereal, millet, and pulse production: there seem minor variations in the agroeconomy of the area. There is evidence for the occurrence of wheat, rice, barley, kodo millet, and pulse crops in Vidarbha (Wardha–Penganga plain, Wainganga basin); barley, rice, kodo millet, and pulses in the Middle Krishna valley and Andhra Ghats south area; and, the remaining parts of South India have mostly produced the evidence of rice, ragi, kodo millet, and pulses. The cattle (including buffalo) predominates over other domesticated species and invariably, in all these sites it accounts for more than 60% of the total faunal assemblage; whereas sheep/goat accounts for only 10–15% and was next only to cattle in importance. This suggests that first the earlier Neolithic tradition of cattle keeping was continued and second it clearly brings home that cattle pastoralism and not sheep/goat pastoralism formed a major preoccupation of the Megalithic society. Thus, irrespective of the variations in agriculture, cattle herding seems to have formed a major preoccupation of the Megalithic society in all these areas.
There is enough evidence that many of the known 400 settlement sites of this period testify that industrial activities such as smithery, carpentry, bead making, and pottery manufacturing were carried out, displaying as they do a highly developed tradition in these crafts. The items of exchange seem to have consisted mainly of iron tools and weapons, copper and gold ornaments, semiprecious beads, and pottery. Although it is not possible at this juncture to give a clearer picture of exchange network of various items in this area, the following areas seem to be major zones of industrial activities.
Kumaun area for iron working; Wainganga basin (or Nagpur plain) and Wardha–Penganga plain for iron, copper, silver, and semiprecious bead working; Telangana peneplain, Rayalaseema peneplain, Gulbarga plain, Bijapur region, Dharwad plateau, and Raichur plain for iron, copper, and gold working; Bangalore region, Mettur–Vellore region, and Coimbatore uplands for iron, gold, and semiprecious bead working.
The location of several large Megalithic sites on the known early historical trade routes leaves a strong possibility of these acting as places/centers for exchange. Although the gravity of exchange mechanism and patterns of consumption still need to be understood, the hierarchical nature of sites and occurence of nonlocal prestige goods such as gold, marine shell, lapis lazuli in Megalithic burials leave little doubt about the inter-regional circulation of these goods. Besides indicating long-distance trade, it also shows growing acquaintance with new areas of the resource-rich zones of South Asia.
The above synthesis of the material conditions of Megalithic society may help us to comprehend its ideological manifestations also. Although no comprehensive attempt has so far been made to understand the Megalithic religion and ritualism, the basic objective here is to know the role of religion and ritualism as part of ideological system of the Megalithic society. The main source of information invariably are the burials as they form a prominent feature and are crucial in understanding some of the ideological facets of the Megalithic society. A casual survey of the cemetery sites shows that megaliths typically cluster in groups, showing continued use of the same burial area for several centuries. However, it is becoming increasingly clear that the megalithic burial monuments were meant to hold only a very restricted number of persons, and the burial took place in them rather rarely, once or twice in a generation. It is also likely that these burials reflect only a certain (upper?) segment of the society.
It may be contextually useful to recapitulate here the nature of burial practices of the preceding periods, that is of the Neolithic and the Chalcolithic phases. Excavations at many Neolithic, and Chalcolithic sites of South Asia have clearly shown the practice of pit, and urn (kept horizontally, mouth-to-mouth) burial methods for disposing of the dead in primary condition. The dead were buried invariably within the settlement and mostly inside the living premises.
In contrast to this practice, during the Megalithic period in general, the dead were buried outside and away from the settlement area. Both primary and secondary burials occur in this period. The three main sepulchral categories which were in vogue during this period, namely the pit burials, chamber burials, and legged/unlegged urn burials have already been emphasized earlier. Certain structural features such as passage, capstone, porthole, and even menhir (a nonsepulchral monument type) served as interchangeables within the aforementioned tomb types and evolved numerous subvarieties in the course of time.
However, what deserves attention here is the continuation of earlier Neolithic/Chalcolithic burial traditions (but now with a stone appendage over the burial). Leaving aside the sharp differences noticed in the actual treatment of the dead, and also the placement of the remains of the dead in an urn placed verticaly, these two burial methods, namely pit burials and urn burials, strongly indicate continuality of an earlier tradition. That this change was gradual and was definitely an indigenous development can be discerned from some of the earliest Megalithic sites such as Ramapuram, Gandlur, and Piklihal. However, same cannot be said about the chamber burial type. In the event of this being a borrowed mortuary practice, it is not clear whether the advent of this new mortuary element signifies the arrival of new people or was it just a borrowed ritual custom. This important aspect needs further investigation. It is also not clear whether the aforementioned sepulchral types, namely the pit burial, chamber burial, and legged/unlegged urn burial methods, indicate different ritualistic concepts connected with the burying of the dead or different ethnic groups.
A brief note regarding the occurence of anthropomorphic figures found in association with Megalithic burials may not be out of context here. The occurrence of these anthropomorphic figures in Megalithic sites right from Central Godavari valley to Tamil Nadu Hills is interesting. So far, from at least 15 Megalithic sites these have been reported. The shape and symbolic sculptural features greatly vary in these anthropomorphic figures. However, one striking feature is that they are invariably associated with chamber tombs and dolmens at most of these sites. Although their significance in the cult of the dead is yet to be comprehended, their close association with burial monuments indicates a connection with ancestor worship.
More importantly, a significant shift in the societal attitude toward certain age categories is discernible during the Megalithic period. In the preceding Neolithic/Chalcolithic period, a large number of infant/child burials and comparatively less adult burials are reported. But, as against this fact, in the Megalithic period very few child burials have been noticed and a majority of the burials are of the young-to-mature adults. Infant burials have not at all been found. Even within the adult category, the percentage of adult males is very high which in all probability strongly indicates the patriarchical nature of Megalithic society as also the dominant status of its male members.
It has been suggested that ritual activities form an active part of the social construction of reality within social formations and may be conceived as a particular form of the ideological legitimation of the social order, serving sectional interests of particular groups. That the construction of these monumental structures, both sepulchral and nonsepulchral, ultimately depended on the social mobilization of resources and societal cooperation is clearly implied.
Detailed ethnographic studies available for some of the ethnic communities such as Savaras, Gadabas, and Bondos, and Kodis practicing megalithism clearly show that these are closely connected with production–feast–alliance cycle. The occurrence of nonlocal prestige goods in limited number of megalithic burials of superordinate social dimension may suggest the control of long-distance trade by local elite groups, the procurement of which eventually depended on alliance and gift exchange. Thus, burials of superordinate category provide a clue as to how surplus production entered the local cycle of prestige building, embedded as it was in alliances and exchange.
It is also widely noticed that the ritualized chiefly organization of land and lineage through ancestor worship in megalithic tombs is a recurrent phenomenon in different parts of the world and occurs both in small-scale and more developed societies. There is a lack of conceptual studies of this genre for the study area, but these analogs do offer insights into the functional and organizational framework of the Megalithic monuments. If we can understand their functional role, it is quite clear that they do not represent burials as we understand them but may have served as ‘living entities’. The dead were not separated from the living, but lived as ancestors in their houses among the living and could be approached when opening the chamber or contacted through rites and offerings. In this way the megaliths symbolized the collective efforts of the community as also the heroic leadership of ancestor chiefs, legitimizing and sustaining the power of their successors. Thus, ritual and religion clearly served material functions in the social organization of production and the tombs formed part and parcel of the reproduction of power relations.
Significantly, the use of iron in these communities seems to have been limited in its initial phase. It is rightly observed that, in the beginning, the use of iron was mostly confined to the production of weaponry and did not contribute much to handicrafts and agriculture and that the weapons were probably in the sole possession of elites. Iron seems to have started playing a significant and effective role in these areas only after c. 500 BC as there is clear evidence in the increase of agricultural and craftsman's tools during this phase.जुनापानी येथील दगडी वर्तुळे ही महाराष्ट्र राज्यातील नागपूरजवळील जुनापानी येथे प्रागैतिहासिक मेगालिथिक वर्तुळे आहेत . जुनापानीभोवती अशी सुमारे ३०० दगडी वर्तुळे आढळतात. [ १ ] १८७९ मध्ये जे.एच. रिवेट-कार्नाक यांनी प्रथम त्यांचे उत्खनन केले होते, त्यातून खंजीर, क्रॉस-रिंग फास्टनर्ससह सपाट कुऱ्हाडी , कुबड्या, अंगठ्या, बांगड्या, घोड्याचे तुकडे, लांब ब्लेड असलेल्या छिन्नी आणि टोकदार चिमटे, कदाचित लाकडी हँडलने झाकलेले असतील अशा विविध लोखंडी वस्तू आढळल्या. [ १ ] काळ्या आणि लाल मातीच्या भांड्यांचे पुरावे देखील आहेत, जसे की काळ्या रंगात रेषीय चित्रे असलेले वाट्या. [ २ ] दफनभूमी केर्न्सने वैशिष्ट्यीकृत होती . सुमारे १५० दगडी वर्तुळांचा अभ्यास आणि दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे वर्तुळांमधील कप-चिन्हांकित दगड जे खगोलीय महत्त्व दर्शवितात. कप-चिन्हांकित दगड विशिष्ट दिशा दर्शविणाऱ्या विशिष्ट ठिकाणी निश्चित केले आहेत यावरून हा पैलू ओळखला गेला आहे. [ ३ ]
जुनापानीचे दगडी वर्तुळ
मूळ नाव
जुनापाणी येथील शिळावर्तुळे ( मराठी )
जुनापानी येथील दगडी वर्तुळ
स्थानजिल्हा नागपूर , महाराष्ट्र .
निर्देशांक२१°११'४९"उत्तर ७८°५९'५६"पूर्व
नियामक मंडळभारतीय पुरातत्व सर्वेक्षण
जुनापानी येथील दगडी वर्तुळे महाराष्ट्रात आहेत.
जुनापानीचे दगडी वर्तुळ
महाराष्ट्रातील जुनापानी येथील दगडी वर्तुळांचे स्थान
या वास्तूंना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) ने राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणून नियुक्त केले आहे. [ 4 ] १९६२ मध्ये ASI ने या जागेचे उत्खनन केले ज्यामध्ये तीन दगडी वर्तुळे सापडली. [ 1 ] टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने अतिरिक्त अभ्यासांना निधी दिला आहे.
सामग्री
भूगोल
स्टोन सर्कलचे आणखी एक दृश्य
जुनापानी येथील दगडी वर्तुळे ही एक निर्जन दफनभूमी आहे जिथे मृतांचे अवशेष असलेले सेपल्क्रल मेगालिथ आहेत. हे मध्य भारतातील नागपूर शहराच्या वायव्येस सुमारे १० किलोमीटर (६.२ मैल) अंतरावर, विदर्भ प्रदेशात एका लहानशा भागात आढळतात. ते बऱ्यापैकी मोठे आकाराचे आहेत, गुगल अर्थवर दिसतात आणि नद्यांच्या काठाजवळ गटबद्ध आहेत. [ 5 ] हे काटोलच्या महामार्गावर स्थित आहे आणि मध्य भारतातील मेगालिथ वितरणाच्या उत्तरेकडील कडा बनवते. [ 6 ]
इतिहास
या प्रदेशात मानवी वस्ती १००० ईसापूर्व पासूनची आहे आणि आजही अस्तित्वात आहे. हा परिसर भारताच्या वायव्य कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग होता. येथे सापडलेले मेगालिथ १००० ईसापूर्व ते ३०० ईसापूर्व पर्यंतचे आहेत. [ उद्धरण आवश्यक आहे ] हे मूल्यांकन मेगालिथिक काळातील सेपल्क्रलमधून सापडलेल्या अनेक पुरातन वस्तूंवर आधारित आहे. येथे सापडलेली लोखंडी अवजारे सुमारे १००० ईसापूर्व काळ दर्शवितात. वेगवेगळ्या कुळांच्या स्थानिक समुदायांनी त्यांची ओळख पटवली आहे. या वर्तुळांमध्ये आढळणारी एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे कप चिन्हांसह दगडांची स्थापना. असा अंदाज आहे की या वर्तुळांचा दक्षिण भारतातील मेनहिर , डोल्मेन आणि इतर नॉन-सेपल्क्रल आणि सेपल्क्रल मेगालिथिक संरचनांशी काहीही संबंध नाही . [ ५ ] १८७९ मध्ये जुनापानीच्या दगडी वर्तुळांच्या उत्खननाचा अहवाल देणारे रिवेट कार्नाक हे पहिले होते. [ ७ ]
जुनापानी हे दुसरे सर्वात मोठे स्थळ आहे, नागपूर प्रदेशातील ५१ स्थळांपैकी १५० मेगालिथिक काळातील दगडी वर्तुळे आणि ८९ विदर्भ प्रदेशात आहेत. १९६१ मध्ये बी.के. थापर या स्थळाच्या उत्खननात सहभागी होते. सुरुवातीला, तीन दगडी वर्तुळे सापडली ज्यापैकी दोन वर्तुळांमध्ये अंत्यसंस्काराच्या वस्तूंशी संबंधित मानवी अवशेष आढळले; इक्विडे (घोडा) कुटुंबातील प्राण्यांचा सांगाडा देखील सापडला. या उत्खननादरम्यान, दगडी वर्तुळांमध्ये फक्त कप-चिन्ह असलेले दगड आढळले. विशिष्ट अभिमुखतेसह निश्चित केलेल्या या कप चिन्हांचे महत्त्व स्थापित करण्यासाठी, टीआयएफआरने या दगडी वर्तुळांचा खगोलशास्त्र किंवा परिसरातील लोकांच्या विश्वविज्ञानाशी काही संबंध आहे का हे स्थापित करण्यासाठी अभ्यास सुरू केला. [ 5 ]
पुरातत्वीय शोध
स्टोन सर्कलमधील एका दगडाचे जवळून दृश्य
अलिकडच्या काळात दगडी वर्तुळांमधील कोंबडीची पिसे तांत्रिक उपासनेचे सूचक आहेत.
या मेगालिथिक दफनभूमीवरील अंत्यसंस्कारातील पुरातन वस्तू लाल रंगाच्या मातीच्या भांड्यांवर (काही मेगालिथिक ग्राफिटी चिन्हांसह ), अभ्रक लाल आणि खडबडीत लाल भांडी रंगवलेल्या आहेत. हे शोध नागपूरच्या पश्चिमेकडील कौंडिन्यपुरा, पौनार , टाकळघाट आणि खापा या प्रदेशातील इतर ठिकाणांवरील समान शोधांशी मिळत्याजुळत्या आहेत; शेवटची दोन ठिकाणे १९६८ मध्ये कृष्णा नदीच्या दोन्ही काठांवर उत्खनन करण्यात आली होती . [ 8 ]
TIFR अभ्यासात (मॅपिंगसह) आतापर्यंत 56 दगडी वर्तुळे समाविष्ट केली गेली आहेत आणि त्यापैकी बहुतेक चांगल्या स्थितीत जतन केल्याचे आढळले आहे; ते काही मीटर व्यासाचे आहेत. यापैकी 20 वर्तुळांवर कपच्या खुणा नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यापैकी सात वर्तुळांना बाजूंना खुणा आहेत. या कपच्या वर्तुळांच्या स्थानाच्या विश्लेषणातून असे लक्षात आले आहे की समांतर रेषा किंवा ऑर्थोगोनल अनुक्रम असलेले कप-खुणा सरळ रेषेत किंवा '+' चिन्ह स्वरूपात दिसतात आणि '+' चिन्ह रेषा वर्तुळाच्या आत किंवा भोवती त्रिज्या किंवा स्पर्शिकरित्या एका निश्चित अभिमुखतेसह संरेखित केल्या आहेत. सर्व कपच्या खुणामध्ये एक विशिष्ट कोनीय श्रेणी देखील नोंदवली गेली आहे, जी 3 क्लस्टर्सच्या स्वरूपात आहेत. [ 5 ]
कपच्या खुणा काही सेंटीमीटर लांबीच्या आहेत, विशेषतः दगडी वर्तुळांच्या बाजूने स्थित आहेत, ज्या त्यांना उत्तरेच्या संदर्भात विशिष्ट कोनात आकाशाकडे दिशा दर्शवितात. रेकॉर्ड केलेल्या दिशानिर्देश उत्तरेकडे ११८, २०८ आणि ३३४ अंश आहेत. विशिष्ट ताऱ्यांच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा आणि ऋतूंमध्ये हवामानातील बदल आणि विशेषतः मान्सूनच्या मावळतीचे दर्शविण्यासाठी हे तारकीय दिशानिर्देशित असू शकतात . [ 5 ] [ 9 ]
या ठिकाणावरून इतरही अनेक शोध सापडल्याची नोंद आहे. एका वर्तुळात लोखंडी जीभ असलेली तांब्याची घंटा आढळली. [ 10 ] उत्खनन केलेल्या तीन वर्तुळांमध्ये, अंत्यसंस्काराच्या ठिकाणी चिकट काळ्या मातीचे ढीग आढळले. येथे अनेक प्रकारची लोखंडी अवजारे देखील सापडली जी या जागेच्या शीर्षकाला "लोखंड-वापर" म्हणून साक्ष देतात. [ 11 ] दगडी मुसळाचा शोध देखील आढळल्याची नोंद आहे. [ 6 ] बी.के. थापर यांना येथे मध्य पाषाणयुगीन अवजारे सापडली
इनामगाव दायमाबाद
इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला.
अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल!
इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे.
या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले.
आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले.
इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची.
इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढे आणखी ४००-५०० वर्षे कुठल्याही वसाहतींचा पुरावा आपल्याला अजून मिळत नाही. मग एकदम सातवाहन कालाच्या थोडं आधीपासून परत एकदा सगळीकडे गावं वसलेली दिसतात. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो.
या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे.
कुणी सांगावं? माझ्या आणि माझ्यासारख्याच आणखी काही वेड्या संशोधकांच्या हाताला कधीकाळी तरी यश येईल, आणि मधले दुवे जुळवणारे पुरावे सापडतील. इनामगावची गोष्ट पूर्ण तर केली पहिजे ना.... या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी!! ताजा कलमः मायबोलीवरच लिहिलेल्या अन्य एका लेखातली माहिती इथे अपडेट करून पुरवणी जोडते आहे - भीमेच्या खोर्यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले आहे.
And the Quest goes on....
संदर्भः
वरील लेखात उल्लेखलेल्या सर्व पुरातत्त्वीय स्थळांचे उत्खनन अहवाल
नकाशे आणी प्रकाशचित्रे -उत्खनन अहवाल व 'First Farmers of the Deccan' - M. K. Dhavalikar
वरदाने वरवंटा म्हणून गुळगुळीत दगडाचा उल्लेख केलाय. केनयात पुर्वापार बदामाच्या आकाराच्या पण जाड ओबडधोबड आकाराचा दगड वापरला जातो. त्यांचा पाटा आपल्यासारखाच म्हणजे आयताकृति असतो पण त्याच्या कडा जरा उंच असतात. म्हणजे वाटायचा पदार्थ खाली सांडणार नाही, याची सोय. (आपल्याकडे ती का नव्हती ?)
या बदामाकृति वरवंट्याची खासियत म्हणजे तो निमुळत्या बाजूकडून हाताने धरायला सोयीचा असतो. असा धरला कि रुंद बाजू खाली येते आणि तिचा वापर करुन वाटायचे.
यांचे वाटण म्हणजे मसाले वा नारळ नसतात. तर जास्त करुन, मक्याचे दाणे वा नाचणी असते. कोरडे दाणे वाटायला हे डि़झाईन अगदी योग्य ! याच दगडाने भुईमूगाच्या शेंगा सोलणे पण सोयीचे जाते.
यांच्या जेवणात रताळी, अरारुट, केळी आदी उकडून, कुस्करुनही वापरतात. त्यासाठी मात्र लाकडी खलबत्ता असतो. तो एकाच लाकडातून कोरून केलेला असतो.
हा लेख फार संक्षिप्त स्वरूपात लिहिलाय म्हणून पाट्याबद्दल फार लिहिलं नाही. पण या काळातील पाट्याचा मध्य खोलगट असल्याने सांडासांडीची काही भानगड नव्हती. तो थोडासा खोगिरासारखा दिसे म्हणून त्याला इंग्लिशमधे saddle quern म्हणतात. आणी वरवंटा म्हणजे गुळगुळीत दगड असं जरी म्हटलं असलं तरी तो काही नर्मदेतल्या गोट्याएवढा नव्हे काही. बरेच वेळा तो एका बाजूने पक्का धरता येईल असा थोडासा निमुळता असे.
आज आपण जसे पाटे वापरतो तसे पाटे सातवाहन कालापासून वापरात आले.
मेधा, या लँडफिल्सची आर्किऑलॉजी फार पूर्वीच झालीये. १९९० च्या दशकात. garbage archaeology, william rathje असा गूगल ला सर्च देऊन बघ. त्यांनी नॅशनल जिओग्राफिक मधेही सर्वांना समजेल असा लेख लिहिला होता. खूप प्रसिद्धी मिळाली होती या कामाला.
भूगोल
हे गाव पुणे शहराच्या पूर्वेस सुमारे ८९ किलोमीटर (५५ मैल) अंतरावर आहे . घोड नदीच्या खालच्या भागात वसलेल्या या प्रदेशात क्रेटेशियस-इओसीन डेक्कन ट्रॅप बेसाल्ट आढळते. [ 1 ]
पुरातत्व स्थळ
इनामगावच्या उत्तरेस सुमारे ३ किलोमीटर (१.९ मैल) अंतरावर सुमारे ५५० मीटर (१,८०० फूट) बाय ४३० मीटर (१,४१० फूट) लांबीचे एक प्राचीन स्थळ आहे. [ 2 ]
या ठिकाणी पाच ढिगारे आहेत. सर्वात मोठ्या ढिगार्याला 'इनामगाव पहिला' असे म्हणतात आणि त्याचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे आणि त्याच्या पुरातत्वीय शोधांचा अभ्यास करण्यात आला आहे. [ 3 ] हे ठिकाण ३८००-३२०० बीपी (कॅलिब्रेटेड) किंवा १८००-१२०० बीपी दरम्यान वसलेले होते.
सुरुवातीच्या आणि नंतरच्या जोर्वे संस्कृतीला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी चॅल्कोलिथिक वस्तीचे उत्खनन करण्यात आले . [ 4 ] इनामगाव येथे चॅल्कोलिथिकचे 3 टप्पे आढळतात.
हे उत्खनन त्याच्या विस्तृत आणि पद्धतशीर प्रक्रियेमुळे भारताच्या पुरातत्व इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. [ 1 ] उत्खननातून अनेक सांस्कृतिक टप्पे उघड झाले ज्यात उशीरा जोर्वे संस्कृती, सुरुवातीचा जोर्वे संस्कृती आणि मालवा संस्कृती यांचा समावेश आहे. पुरातत्वशास्त्रातील निष्कर्ष डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था आणि छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय यासारख्या विविध संग्रहालयांमध्ये उपलब्ध आहेत . [ 5 ]
सध्याचे सामाजिक जीवन
अधिक जाणून घ्या
या विभागात कोणत्याही स्रोतांचा उल्लेख नाही . ( मार्च २०२२ )
आधुनिक काळातील इनामगाव विकासाच्या मार्गावर आहे. शेती आणि संबंधित व्यवसाय हे इनामगावचे प्रमुख उत्पन्नाचे स्रोत आहेत. घोड नदी सांस्कृतिक आणि सामाजिक इमारतींसाठी अनुकूल आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने इनामगावला पाणी साठवण प्रकल्पांसाठी दोन जलाशय आणि लहान धरणे दिली आहेत. पाणी साठवण्यासाठी हे जलाशय आणि लहान धरणे पाणी साठवण्यास आणि पाण्याची उपलब्धता कमी करण्यास मदत करतात. वस्तीमध्ये सर्व प्रकारचे प्रीस्कूल , प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा आहेत . न्यू इंग्लिश स्कूल इनामगाव ही एक माध्यमिक शाळा आहे. इनामगावच्या शेतकऱ्यांचा दोन वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये भांडवली हिस्सा आहे . श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना आणि घोडगंगा साखर कारखाना . औद्योगिक प्रतिष्ठाने जवळ आहेत आणि ग्रामस्थांच्या रोजगारासाठी अनुकूल आहेत. इनामगावला पेट्रोल स्टेशन आणि सामाजिक मेळाव्याचे आयोजन केले जाते . वस्तीला विविध राष्ट्रीय बँकांकडून सेवा दिली जात आहे, तथापि फक्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच उपस्थिती दर्शवते. ग्रामस्थांच्या एकत्रित भांडवली हिस्सा आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाठिंब्याने सहकारी संस्था स्थापन झाली आहे, ज्यामुळे गरजू शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना गरजूंना मदत मिळते. ही सहकारी संस्था नियामक संस्था गावकऱ्यांनी निवडून दिलेल्या लोकांद्वारे स्थापन केली जाते.
इनामगाव आणि परिसरात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे व बदलत्या हवामानामुळे येथे अस्तित्वात असणारी प्राचीन मानवी संस्कृती नष्ट झाली होती. हजारो वर्षांचे हे अवशेष काळाच्या ओघात खाली गाडले गेले.
१९६७ मध्ये ही मानवी संस्कृती गावकऱ्यांच्या हाती लागली. त्यातूनच पुढे १९६७ ते १९८२ अशी सलग १५ वर्षे पुणे विद्यापीठ व डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने या टेकडयांचे उत्खनन करून संशोधन झाले.
त्या काळची भांडी, कालव्याद्वारे पाणी नेऊन शेती करण्याची अत्याधुनिक पध्दत, शिकारीसाठीची हत्यारे, मृत व्यक्तींना रांजणाच्या आकाराच्या भांडयात दफन करण्याची पद्धत यावरून ही संस्कृती किती प्रगत होती याचे पुरावे हाती लागले होते. तेथून पुढे देशभरातील संशोधकांच्या नजरा इनामगाव कडे वळल्या इनागावकडे अभ्यासक आणि संशोधकांची रांग लागली.
याठिकाणी शोध लागलेल्या संस्कृतीचे आर्य आणि द्रविड संस्कृतीबरोबर व्यापारी संबंध आणि देवाणघेवाण होती हे ही सिद्ध झाले आहे. ही मानवी वसाहत सुमारे ३००० वर्षापूर्वीची व ताम्रपाषाणयुगीन असल्याचा निष्कर्ष निघाला.
महाराष्ट्रातील आद्य शेतकन्यांची पहिली वसाहत याच ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाले. मातृपितृ देवतांच्या मूर्ती व स्वस्तिक चिन्ह त्या काळीही अस्तित्वात होते यांचा उलगडा झाला. घोड नदीचे विस्तीर्ण पात्र, त्याकडेला असणाऱ्या मातीच्या उंच सखल टेकडया, विविध रंगी पक्ष्यांचे थवे, निसर्गरम्य परिसर हे सर्व पाहिल्यावर ही जागा मानवी वसाहतीसाठी किती योग्य होती यांचा अंदाज येतो.
विविध दंतकथांनी प्रसिद्ध असलेली व अस्तित्वात असणाऱ्या कुलदेवतांचे साजरे होणारे सण, वसाहतीच्या ठिकाणी आज सापडणारे पुरातन काळातील मातीच्या भांडयांचे तुकडे पाहताना मन भारावून जाते. उत्खननात सापडलेल्या वस्तू १९८२ मध्ये लंडन येथे भारवलेल्या जागतिक प्रदर्शनात ठेवल्या होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेज, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय व नगर येथील संग्रहालयात येथील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. आजही या ठिकाणी देश-विदेशातील हजारो संशोधक भेटी देऊन या ठिकाणची माहिती घेताना दिसत आहेत.
'पुरातत्त्व'च्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व -
येथे शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिली कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्याची पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. अस्थी कुंभात दफन करण्याच्या येथील पद्धतीमुळे यांचा द्रविड संस्कृतीशीही संबंध येतो. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्वाच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी !
गेल्या अनेक वर्षांपासून हे अतिप्राचीन ठिकाण, येथील संस्कृती, उत्खननात सापडलेली भांडी यांचे जतन आणि संवर्धन व्हावे अशी ग्रामस्थ, अभ्यासक, संशोधक यांची मागणी होती. या साठी १९८२ सालापासून ग्रामस्थांचे प्रयत्न सुरु होते. सन १९८४ मध्ये या ठिकाणाला राज्य संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळाला.
पुढे देश विदेशातील हजारो संशोधक या ठिकाणाला भेट देऊन गेले. आता ग्रामस्थांसह सर्वांच्याच मागणीचा विचार करून शासनाने एकछत्र योजनेतून सुमारे साडे सहा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार आणि यापुढे शासनाकडून या ठिकाणास जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळावी अशी आमची मागणी आहे - तुकाराम मचाले ( इतिहास अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते, इनामगाव )
महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत, शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याची पहिली पद्धत आणि स्वस्तिकचे भांडे हे सर्व सापडले होते इनामगाव येथील उत्खननस्थळी; मात्र सध्या हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या उत्खनन स्थळाला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी इनामगाव ग्रामस्थांनी केली आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
पुण्यापासून १०० किलोमीटर व शिरूरपासून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेले इनामगाव हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे. घोड नदीतीरावर असलेले हे दुष्काळी गाव आहे. इनामगाव येथे सन १९६८ ते १९८३ च्या दरम्यान घोड नदीतीरावर असलेल्या पाच टेकड्यांवर उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन डॉ. ह. धो. सांकलीचा, डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. झै. अन्सारी या शास्त्रज्ञांच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आले होते. (पुणे उत्खनन स्थळ)
या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन मानवी संस्कृतीचे अवशेष सापडले होते. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत याच ठिकाणी होती. या उत्खननात हत्ती, रानटी बैल, रानमेंढी, शेळी आदींसह सस्तन प्राण्यांचे जीवाष्म आढळले होते. आद्य शेतकऱ्यांची घरे, हत्यारे यामध्ये (तासण्या, भोक पडण्याचे हत्यार, छिलके, टोकदार हत्यारे), वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी (लाल किंवा लाल-काळी), शेतीची अवजारे आदी आढळून आली होती. हा काळ तब्बल ४० ते ५० हजार वर्षांपूर्वीचा आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
मात्र सध्या गेल्या अनेक वर्षांपासून हे उत्खनन स्थळ शासकीय अनास्थेमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे उगवली आहेत. या ठिकाणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मचाले यांनी संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळावा, तसेच हे स्थळ विकसित करण्यात यावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
वस्तू व अवशेषांचा ब्रिटन येथील प्रदर्शनात सहभाग
इनामगाव येथील उत्खननातील अवशेष व वस्तू डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, अहमदनगर व भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या उत्खननातील वस्तू व अवशेषांचा १९८२ साली ग्रेट ब्रिटन येथे जागतिक प्रदर्शनामध्ये सहभाग होता.
द्रविड संस्कृतीशी संबंध झाला होता उघड
त्याकाळी शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याची पहिली पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. येथील अस्थी कुंभात दफन करण्याच्या पद्धतीमुळे यांचे द्रविड संस्कृतीशीही संबंध होते. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्त्वच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दख्ख:नच्या पठारावर वाहणार्या भीमा या कृष्णेच्या प्रमुख उपनदीला, घोड ही नदी, दौंड गावाजवळ येऊन मिळते. या घोड नदीच्या काठावर आणि पुण्यापासून सुमारे 85 किमी अंतरावर, ‘इनामगाव‘ या नावाचे एक गाव वसलेले आहे. या इनामगावापासून सुमारे 3 मैल अंतरावर असलेल्या साधारण 65 एकर (500 X 500 m) एवढ्या पसार्याच्या अर्धवर्तुळाकार आवारात, मातीच्या 5 छोटेखानी टेकड्या किंवा उंचवटे दृष्टीस पडतात. 5 उंचवट्याचाहा परिसर, पुरातत्त्व शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा असा आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज या संस्थेतील पुरातत्त्व विभागाच्या शास्त्रज्ञांनी,या परिसरात मोठे विस्तृत प्रमाणातील उत्खनन, 1968 ते 1982 या 14 वर्षाच्या कालखंडात केलेले आहे.
इनामगाव येथील उत्खनन झालेले हे स्थळ मोठे वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. इतिहासकार भारताच्या गत कालाचे दोन भाग मानतात. यापैकी शाक्यमुनी सिद्धार्थ गौतम बुद्ध याच्या कालापासून (इ.स.पूर्व 563 to 486 ) पुढच्या कालखंडाचे, ऐतिहासिक खंड असे नामानिधान केले जाते तर या पूर्वीच्या कालखंडाला,पूर्व–ऐतिहासिक कालखंड या नावाने ओळखले जाते. याचे कारण असे आहे की गौतम बुद्धाच्या कालापासूनच्या पुढच्या इतिहासाबद्दल,कोणत्या ना कोणत्या स्वरूपातला,लिखित पुरावा उपलब्द्ध झालेला आहे. मात्र या आधीच्या कालखंडाच्या इतिहासाबद्दल कोणताच लिखित पुरावा उपलब्ध नाही. इनामगाव या स्थळाचे वैशिष्ट्य हे आहे की ऐतिहासिक कालखंड आणि त्या आधीचा,पूर्व–ऐतिहासिक कालातील सिंधू–सरस्वती संस्कृतीचा कालखंड,या दोन्हीना जोडणार्या कालात(bridges the pre-historic and historic periods), इनामगाव उत्खनन स्थळ, हे सातत्याने एक मानवी वसतीस्थान राहिलेले आहे.
कच्छ मधील धोलावीरा येथील उत्खननात मिळालेले इ.स.पूर्व 1600 मधील वर्तुळाकार आकाराच्या घराचे अवशेष
इनामगाव येथील उत्खननावरून दिसून येते की या स्थानी,इ.स.पूर्व 1600 ते इ.स.पूर्व 700 या कालखंडात सातत्याने मानवी वस्ती होती. त्यामुळे असे म्हणता येते की इ.स.पूर्व 1600च्या सुमारास विलयास गेलेली भारताच्या वायव्य भागातील सिंधू–सरस्वती संस्कृती आणि गौतम बुद्धांचा (इ.स.पूर्व 600) काल यामधील कालखंडाचा इनामगाव हा एक दुवा आहे. आता सर्वसाधारणपणे असे मानले जाते की मूर्तीपूजक सिंधू–सरस्वती संस्कृतीची जागा,अग्नीपूजक वैदिक संस्कृतीने इ.स.पूर्व 1900 ते इ.स.पूर्व 1600 या कालखंडात निदान उत्तर भारतात तरी घेतली होती. त्यामुळे इनामगाव येथील उत्खनन या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जाते.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील मानवी वस्तीचे तीन कालखंडात विभाजन केलेले आहे. यापैकी पहिल्या कालखंडाला ((1600-1400 इ.स.पूर्व) ‘माळवा संस्कृती‘, 1400-1000 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘पूर्व जोरवे संस्कृती‘ आणि 1000-700 इ.स.पूर्व या कालखंडाला ‘उत्तर जोरवे संस्कृती‘ या नावाने ते ओळखतात.
इनामगाव येथील उत्खननात मिळालेले माळवा संस्कृतीकालीन वर्तुळाकार आकाराचे व जमीनीखाली तळ असलेले घर
पुरातत्त्व शास्त्रज्ञ आता असे मानतात की सिंधू–सरस्वती संस्कृतीतील वस्त्या तेथे उपलब्ध असलेले जलस्रोत हळूहळू आटत गेल्याने पूर्वेकडे व दक्षिणेकडे सरकू लागल्या व यापैकी काही वस्त्या मध्य प्रदेशातील माळवा भागात स्थिरावल्या होत्या. इनामगाव मध्ये सर्वात प्रथम वस्ती करण्यास आलेले माळवा संस्कृतीतील मानव,हे या माळवा भागाकडून आलेले होते. या वरून असा निष्कर्ष काढणे फारसे चूक ठरणार नाही की मूळ सिंधू–सरस्वती खोर्यातून आलेल्या लोकांच्या वस्त्यांपैकी काही वस्त्या पुढे आणखी दक्षिणेला म्हणजे दख्खनच्या पठारावर सरकल्या व इनामगाव सारख्या अनेक ठिकाणी येऊन स्थिरावल्या,किंबहुना इनामगाव मधील माळवा संस्कृतीतील वस्ती ही मूलत: सिंधू–सरस्वती संस्कृतीतील लोकांची होती. इनामगाव येथे उत्खनन झालेल्या माळवा संस्कृती घरांमध्ये सापडलेल्या आणि स्त्रीफलोधारणेचे प्रतीक असलेल्या स्त्री मूर्तींचे याच प्रकारच्या सिंधू–सरस्वती संस्कृतीमधील वस्त्यांमध्ये सापडलेल्या मूर्तींशी असलेले साधर्म्य लक्षात घेतले तर हा निष्कर्ष योग्य आहे असेच वाटते.
इनामगाव येथे सापडलेले पूर्व जोरवे संस्कृतीतील चौकोनी आकाराचे व जमीनीखाली तळ असलेले घर
इनामगाव मध्ये यानंतर म्हणजे 1400-1000 इ.स.पूर्व मध्ये किंवा पूर्व जोरवे संस्कृती कालखंडात स्थायिक झालेले लोक, प्रवरा–गोदावरी खोर्यांतून आलेले किंवा स्थानिक लोक होते. पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी इनामगाव मधील उत्खननावरून काढलेला सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही इनामगावमध्ये बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या.
पुरातत्त्व विभागाचे शास्त्रज्ञ उत्खनन करत असलेल्या बहुसंख्य स्थानांवर भूतकाळातील एका पाठोपाठ एक होऊन गेलेल्या सांस्कृतिक कालांचे अवशेष हे बहुधा उभ्या पातळीमध्ये, एकाच्या डोक्यावर एक या पद्धतीने साठत गेलेले असतात. त्यामुळे जितके खोल खणत जावे तितके आपण जास्त जास्त गतकालात पोचत असतो. परंतु इनामगावचे वैशिष्ट्य हे आहे की येथे होऊन गेलेल्या तिन्ही संस्कृतींचे अवशेष हे एकाच पातळीवर विखुरलेले आढ्ळतात. त्यामुळे एका ठिकाणी घेतलेल्या खड्ड्यात फक्त एकाच संस्कृती कालाचे अवशेष आढळतात.
अमेरिकन लोक खूप वेळा त्यांच्या म्हणजे अमेरिकन संस्कृतीला, वितळवून एकवटणार्या हंड्याची (melting pot) उपमा देत असतात. त्यांच्या मताने अमेरिकेत बाहेरून सतत येत असलेल्या नाना वंशांच्या, खंडांमधल्या आणि जातीधर्माच्या स्थलांतरितांच्या एकत्रीकरणामुळे अमेरिकेची अशी खास आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती निर्माण झाली आहे. येणारा प्रत्येक स्थलांतरित या संस्कृतीच्या हंड्यातील उकळणार्या रसायनाला आपले खास असे वैशिष्ट्य बहाल करत त्या रसायनात वितळून जात असतो. इनामगाव येथील उत्खननावरून शास्त्रज्ञांनी काढलेला आणि वर उल्लेख केलेला निष्कर्ष बघता मला असे कुतूहल वाटते आहे की इनामगावला असेच काहीसे झाले असेल का? सिंधू–सरस्वती खोर्यांतून येणारी उत्तर भारतीय संस्कृती व या भागात आधीच स्थायिक झालेल्या दक्षिण भारतीयांची संस्कृती या अशाच एकमेकात मिसळून गेल्या असतील का? काही कालापूर्वी CSIR या भारतीय संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासात, दख्खनच्या पठारावर आणि दक्षिणेकडे स्थायिक झालेले लोकांनी मूलतः मलै द्वीपकल्पावरून तेथे स्थलांतर केले असावे असा अंदाज बांधलेला होता. हे लोक आणि सिंधू–सरस्वती संस्कृती मधून आलेले लोक हे इनामगाव सारख्या अनेक स्थानांवर एकत्र मिसळून गेले असतील, का त्यांनी आपापल्या संस्कृती अलग ठेवल्या असतील?
गेल्या हजार पंधराशे वर्षांमध्ये रचल्या गेलेल्या काही ग्रंथांचा आधार घेतला (महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र, मनुस्मृती), तर असे दिसते की वैदिक किंवा नंतर हिंदू धर्माचे पालन करत असलेला भारतीय समाज, सर्वव्यापी असणार्या एका ‘जातीव्यवस्था‘ किंवा चतुर्वर्ण या नावाने ओळखल्या जाणार्या सामाजिक बंधात संपूर्णपणे जखडून गेला होता व आहे. या जातीव्यवस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटीबेटी व्यवहार, फक्त आपल्या जातीपुरता मर्यादित ठेवणे (endogamous) हे होते किंवा आहे. मग असे जर असले तर इनामगाव सारख्या स्थानावर या जात किंवा वर्ण व्यवस्थेचे पालन होत असेल? का उत्तर भारतीय आणि दख्खनच्या पठारावरील स्थायिक लोक यांच्यात रोटीबेटीचे व्यवाहार चालू होऊन एक नवा भारतीय समाज निर्माण झाला असेल?
या प्रश्नांची उत्तरे देणे कोणाला शक्य होईल असे मला तरी वाटले नव्हते, परंतु हैद्राबाद येथील CSIR-Centre for Cellular and Molecular Biology आणि Harvard Medical School या दोन संशोधन संस्थांमध्ये कार्यरत असणार्या शास्त्रज्ञांच्या एका गटाने एकत्रपणे किंवा सहकार्याने केलेल्या एका अभ्यास उपक्रमाच्या निष्कर्षांवरून हे उत्तर देणे आता शक्य झाले आहे. प्रिया मूरजानी, कुमारसामी थांगराज, निक पॅटरसन, मार्क लिपसन, पो–रु–लोह, पेरियासामी गोविंदराज, बॉनी बेर्जर, डेव्हिड राइच आणि लालजी सिंह ( Priya Moorjani, Kumarasamy Thangaraj, Nick Patterson, Mark Lipson, Po-Ru Loh, Periyasamy Govindaraj, Bonnie Berger, David Reich and Lalji Singh) या शास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यास उपक्रमाचे निष्कर्ष, ‘Genetic Evidence for Recent Population Mixture in India’ या नावाने लिहिलेल्या संशोधन प्रबंधात‘American Journal of Human Genetics.‘ या मासिकात प्रसिद्ध केले आहेत.
जनुकशास्त्राच्या आधाराने केलेल्या या अभ्यास उपक्रमाचा हा अहवाल हे स्पष्टपणे सांगतो:
“भारतात आढळणारे बहुतेक जनुकीय गट हे दोन एकमेकापासून भिन्न असलेल्या मानवी जनसमुदायांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या जनुकीय गटाचे वंशज असल्याचे दिसते: मध्य एशिया, मध्यपूर्व, कॉकेशस पर्वत रहिवासी आणि युरोपियन यांच्या वंशमिश्रणातून आलेले “पूर्वज उत्तर भारतीय (ए एन आय)” आणि भारतीय उपखंडाबाहेरील कोणत्याही जनुक गटाशी साधर्म्य नसलेले “पूर्वज दक्षिण भारतीय (ए एस आय)” हे ते दोन भिन्न जनुकीय गट आहेत.”
“ Most Indian groups descend from a mixture of two genetically divergent populations: Ancestral North Indians (ANI) related to Central Asians, Middle Easterners, Caucasians, and Europeans; and Ancestral South Indians (ASI), not closely related to any groups outside the subcontinent.”
या अभ्यास प्रकल्पावर कार्य करणार्यांना असे आढळून आले की त्यांनी रक्त चाचणी केलेल्या प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या जनुकीय भूतकालाचा सर्वात पूर्व संबंध, एकतर युरोप–एशिया मधून आलेला पहिला गट किंवा मूळ आफ्रिकेतून आलेला दुसरा गट यांच्याशी निर्विवादपणे जोडता येत असला तरी नंतर या दोन्ही गटांचे आपापसात रोटीबेटी व्यवहार झाल्याने एकमेकाशी जनुकीय मिश्रण होऊन जो एक नवीन एकात्मक जनुकीय गट झाल्याचे लक्षात येते त्याच्याशी सुद्धा या सर्व भारतीय व्यक्तींचा स्पष्ट जनुकीय संबंध असल्याचे सिद्ध होते. मात्र गतकालातील एका अज्ञात क्षणापासून पुढे,याच भारतीय व्यक्तींचे जनुकगट, भाषा, धर्म आणि अदिवासी समाज गट यांच्यावर आधारित असे भिन्न भिन्न गट होत जाऊन आता त्यांचे 4635 भिन्न जनुकीय गट तयार झाले आहेत.
याचा अर्थ असा होतो की इनामगाव सारख्या अनेक मानवी वस्तींमध्ये उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय यांच्यामध्ये वाढत गेलेल्या रोटीबेटी व्यवहारामुळे निर्माण झालेले भारतीय एकवटणार्या हंड्यातील उकळते जनुकीय रसायन, गतकालातील या अज्ञात क्षणापासून पुढे एकदम गोठून गेले व भारतीय समाजाचे भाषा, धर्म,जात आणि अदिवासी संस्कृती यांच्यानुसार विभाजन होत राहिले. आता प्रश्न असा उभा राहतो की हा अज्ञात क्षण गतकालात कधी आला असेल? तो इनामगावमध्ये मानवी वस्ती होती त्या कालाच्या आधी आला की नंतर?
या प्रकल्पावर कार्य करणार्या शास्त्रज्ञांना या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले आहे. ते म्हणतात की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय मिश्रण हे सुमारे 4200 वर्षांपूर्वी (इ.स.पूर्व 2200) किंवा उत्तर हडप्पा संस्कृतीकालात सुरू झाले. या कालापासून पुढची 2100 वर्षे म्हणजे 1900 वर्षांपूर्वीपर्यंत (इ.स.पहिले शतक) हे जनुकीय मिश्रण अबाधितपणे चालू राहिले. या सामाजिक बदलाबद्दल हा अहवाल म्हणतो:
” हा 2100 वर्षांचा काल हा एक महत्त्वाचा संक्रमणकाल होता. या कालात सिंधू संस्कृतीतील नागरीकरण विलयास गेले. गंगा खोर्यातील जनसंख्या सतत वाढत राहिली आणि भारतीय–युरोपियन भाषागट आणि वैदिक धर्म हे उदयास आले.”
“It was a time of profound change, characterised by the de-urbanisation of the Indus civilisation, increasing population density in the Gangetic system, and the likely appearance of Indo-European languages and Vedic religion.”
या 2100 वर्षाच्या संक्रमण कालानंतर अकस्मातपणे ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया संपूर्णपणे थांबली किंवा एकवटणारा हा हंडा गोठून गेला. या अहवालाप्रमाणे जनुकीय प्रक्रिया थांबण्याचा हा क्षण इ.स. पहिल्या शतकामध्ये आला.
ग्रीक इतिहासकार मेगॅस्थेनिसने साधारण इ.स.पूर्व 300 मधे लिहिलेल्या आपल्या इंडिका या ग्रंथात भारतातील जाती किंवा वर्ण व्यवस्थेचा उल्लेख केलेला आहे त्याचप्रमाणे यानंतरच्या कालात लिहिल्या गेलेल्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि लेखन काल अचूक रित्या ज्ञात नसलेल्या महाभारतात सुद्धा चतुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. हे सर्व ग्रंथ वर उल्लेख केलेल्या जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबण्याच्या कालाच्या 200 ते 300 वर्षे आधी लिहिले गेले असल्याने आपल्याला एक अत्यंत रोचक असा निष्कर्ष काढणे शक्य आहे. या निष्कर्षाप्रमाणे जरी चतुर्वर्ण व्यवस्थेला अधिकृतता इ.स.पूर्वी काही शतके प्राप्त झालेली असली तरी सर्वसाधारण भारतीय समाज हा अजूनही एकसंध होता व त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार पुढे काही शतके तरी चालूच राहिले होते. ( आपण असे मानतो की मनुस्मृती या ग्रंथात चतुर्वर्ण व्यवस्थेचे नियम प्रथम लिहिले गेले. या अहवालाप्रमाणे मनुस्मृती हा ग्रंथ ही जनुकीय मिश्रण प्रक्रिया थांबल्याच्या किंवा इ.स. पहिले शतक या कालानंतर लिहिला गेलेला आहे.)
जनुकशास्त्राचा कोणताही अभ्यासक आपल्याला सांगू शकेल की वर उल्लेख केलेला एकवटणारा जनुकीय हंडा गोठून जाणे ही बाब कोणत्याही समाजाच्या भविष्यकालाच्या दृष्टीने हितावह अशी बाब असू शकत नाही. या बाबतीत हा अहवाल म्हणतो:
” भारतातील सध्याच्या पिढीत जे अनुवंशिक आणि जनुकीय रोग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत त्यांचे वाढलेले प्रमाण मागच्या 1900 वर्षे सतत झालेल्या जाती अंतर्गत विवाहांमुळे (endogamous) असले पाहिजे.”
“An important consequence of these results is that the high incidence of genetic and population-specific diseases that is characteristic of present-day India is likely to have increased only in the last few thousand years when groups in India started following strict endogamous marriage.”
इनामगावकडे आपण परत वळूया. इनामगाव येथील मानवी वस्ती ही भिन्न असलेल्या मानवी संस्कृतीचे एकत्रीकरण करणारा एक खराखुरा ‘वितळवणारा हंडा‘ होता आणि अशा शेकडो इनामगावांच्या आधारावर एकत्रीकरण झालेली नवीन आधुनिक भारतीय संस्कृती आणि लोक उदयास आले असे म्हणणे वावगे ठरू नये.
शेवटी आपल्याला माहीत असलेल्या ऐतिहासिक आणि पूर्व–ऐतिहासिक घटनांचा संबंध या अहवालाशी कसा लावता येतो ते आपण पाहूया.
इ.स.पूर्व 10000 वर्षांपासून वायव्येकडून भारतीय द्वीपकल्पात स्थलांतरितांचे आगमन सतत होत आलेले आहे. या स्थलांतरितांनी आपली संस्कृती सिंधू–सरस्वती खोर्यांत स्थापन केली. ही संस्कृती इ.स.पूर्व 2000 पर्यंत अबाधित राहिली. या लोकांचा दख्खनच्या पठारावर राहणार्या आणि मूलतः मलै द्वीपकल्प किंवा अंदमान–निकोबार बेटे येथून आलेल्या लोकांशी फारसा काहीच संबंध न आल्याने त्यांच्यात रोटीबेटीचे व्यवहार झाले नाहीत व त्यांची संस्कृती दख्खनच्या पठारावरील लोकांपेक्षा भिन्न राहिली. या अहवालात ही गोष्ट स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे की पूर्वज उत्तर भारतीय व पूर्वज दक्षिण भारतीय यांच्यामधील जनुकीय मिश्रण या कालापर्यंत झालेले आढळून येत नाही.
सिंधू–सरस्वती खोर्यांतील जलस्त्रोत जसजसे आटू लागले तेंव्हा येथील रहिवाशांनी पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे स्थलांतर चालू केले. या कालात इनामगाव सारख्या अनेक वस्त्या निर्माण झाल्या असणार. इनामगाव मध्ये मालवा संस्कृती आणि पूर्व जोरवे संस्कृती या दोन्ही बर्याच मोठ्या कालखंडासाठी एकत्रपणे नांदत होत्या, हा पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष या ठिकाणी म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. या कालापासून हळूहळू या दोन संस्कृतींमध्ये रोटीबेटी व्यवहार सुरू होऊन एक नवे जनुकीय भारतीय मिश्रण तयार झाले व हे मिश्रण इनामगावमधेच बौद्ध कालापर्यंत (इ.स.पूर्व 600) अधिक अधिक दाट होत गेले.
या अहवालामुळे प्रकट झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाती वर्ण व्यवस्थेचे प्राबल्य हे इ.स.पहिल्या शतकानंतर भारतामध्ये रूढ झाले. हा शोध दोन कारणांसाठी विलक्षणच म्हणावा लागेल. प्रथम म्हणजे भारतात किंवा उत्तर–वायव्य भारतात तरी वैदिक संस्कृती, साधारणपणे सिंधू–सरस्वती संस्कृती विलयास गेल्यानंतरच, बहरात आली असली तरीही या अहवालाप्रमाणे त्या पुढची 2000 वर्षे तरी चतुर्वर्ण पद्धत भारतात मोठ्या प्रमाणात प्रचलित नव्हती. दुसरे कारण म्हणजे ज्या धर्माचे सर्व लोकांमधील समानता हे महत्त्वाचे सूत्र होते तो बौद्ध धर्म ऐन बहरात असताना,किंवा इ.स.पहिल्या शतकात,ही चतुर्वर्ण पद्धती संपूर्ण समाजात अतिशय कडक रित्या राबवली जाऊ लागली.
मला हा शोध अतिशय रोचक वाटतो आहे कारण अनेक लोकांची अशी समजूत नव्हे खात्रीच असते की 4000 वर्षे पूर्वी जेंव्हा वैदिक संस्कृती भारतात उदयास आली तेंव्हापासून चतुर्वर्ण पद्धत रूढ झालेली आहे. या अहवालाप्रमाणे ही गोष्ट सत्य नसून प्रत्यक्षात समानतेचा उपदेश करणारा बौद्ध धर्म जेंव्हा सर्वमान्य होता त्या वेळेपासून चतुर्वर्ण पद्धत समाजात रूढ झाली. सारांशाने असे म्हणता येईल की चतुर्वर्ण पद्धत फक्त मागच्या 1900 वर्षांपूर्वी रूढ झालेली आहे.
इनामगाव येथील मानवी वस्ती आणि या सारख्या शेकडो अज्ञात जागा या भारताच्या जनुकीय अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात कारण या अनेक इनामगावांमध्येचएका 2000 वर्षांच्या कालखंडात,खरीखुरी भारतीय व्यक्ती व खरा भारतीय जनुकीय गट,जनुकीय मिश्रणाने निर्माण झाला. यानंतर जातीव्यवस्थेचा किंवा चार्तुवर्ण पद्धतीचा एक मोठाच अडसर या जनुकीय मिश्रणापुढे निर्माण झाला व हे जनुकीय मिश्रण आहे तेथेच गोठून गेले.
इनामगाव पुरातत्व स्थळ समजून घेणे
इनामगाव हे महाराष्ट्र राज्यातील एक अतिशय महत्त्वाचे पुरातत्वीय स्थळ आहे. दख्खन प्रदेशातील सुरुवातीच्या शेती समुदायांबद्दल महत्त्वपूर्ण पुरावे देण्यासाठी हे विशेषतः ओळखले जाते. हे स्थळ आपल्याला हजारो वर्षांपूर्वी जगलेल्या लोकांच्या जीवनाबद्दल, संस्कृतीबद्दल आणि पद्धतींबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी देते.
इनामगावचे स्थान
इनामगाव पुरातत्व स्थळ विशेषतः घोड नदीच्या काठावर वसलेले आहे. घोड नदी ही भीमा नदीची उपनदी आहे, जी मोठ्या कृष्णा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे. नदीजवळील स्थान सुरुवातीच्या वसाहतींसाठी महत्त्वाचे होते, ज्यामुळे शेती, पिण्यासाठी आणि इतर दैनंदिन गरजांसाठी पाणी उपलब्ध होते.
इनामगावचे महत्त्व
इनामगाव हे जोर्वे संस्कृतीशी संबंधित एक प्रमुख स्थळ आहे, जे महाराष्ट्रातील तांबेयुगातील संस्कृती आहे, जी अंदाजे १४०० ते ७०० ईसापूर्व आहे. इनामगाव येथील उत्खननातून असे दिसून आले आहे:
मातीच्या भिंती आणि गवताच्या छतांनी बनवलेल्या घरांसह नियोजित वसाहतींचे पुरावे.
गुंतागुंतीची सामाजिक संघटना, कदाचित दफन पद्धती आणि घराच्या आकारांवर आधारित स्थितीतील फरक समाविष्ट करणे.
शेतीचा सराव, प्रामुख्याने बार्ली, गहू, मसूर आणि विविध बाजरी पिकवणे.
जनावरांचे पालन, ज्यामध्ये गायी, मेंढ्या, शेळ्या आणि डुकरांचा समावेश आहे.
मातीकाम (वेगळी जोर्वे भांडी), मणी बनवणे आणि तांब्याचे काम यासारख्या हस्तकला उपक्रम.
इनामगाव येथील निष्कर्ष पुरातत्वशास्त्रज्ञांना या प्राचीन समुदायांच्या जीवनशैली आणि उपजीविकेच्या पद्धतींची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात.
पर्यायांचे विश्लेषण करणे
इनामगाव जागेच्या संदर्भात दिलेल्या पर्यायांचा विचार करूया:
इंद्रायणी नदी: महाराष्ट्रातील (पुण्याजवळ) एक महत्त्वाची नदी असली तरी, इनामगाव तिच्या काठावर वसलेले नाही.
उल्हास नदी: ही नदी महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशातून वाहते, इनामगाव जिथे आहे तिथे नाही.
घोड नदी: इनामगाव हे घोड नदीच्या काठावर वसलेले असल्याचे ऐतिहासिक आणि पुरातत्वीयदृष्ट्या दस्तऐवजीकरण केलेले आहे.
कुकडी नदी: ही महाराष्ट्रातील दुसरी नदी आहे, परंतु इनामगाव तिच्या काठावर वसलेले नाही.
पुरातत्वीय शोध आणि भौगोलिक नोंदींनुसार, घोड नदी हीच खरी नदी आहे.
इनामगावमध्ये अनेक टप्प्यांत वस्ती होती, ज्यामध्ये वसाहतीच्या पद्धती आणि दफन पद्धतींमध्ये उत्क्रांती दिसून येते. सर्वात जुना टप्पा माळवा संस्कृतीच्या प्रभावाशी संबंधित आहे, त्यानंतर मुख्य जोर्वे संस्कृतीचा काळ येतो. ७०० ईसापूर्व या जागेचा नाश झाला, कदाचित हवामान बदलांमुळे किंवा शेतीवर परिणाम करणाऱ्या इतर पर्यावरणीय घटकांमुळे.
पाच खोल्या असलेले घर आणि घरातच दफनभूमी सापडणे, कदाचित एखाद्या प्रमुखाचे, हे सामाजिक पदानुक्रम सूचित करते. मुलांसाठी कलश दफन आणि प्रौढांसाठी विस्तारित किंवा पिथोस दफन यासारखे विविध प्रकारचे दफनविधी देखील त्यांच्या रीतिरिवाजांबद्दल संकेत देतात.
https://www.maayboli.com/node/69679
उदक राखिले युक्तीने - दख्खनच्या आद्य कालव्याची गोष्ट
(भवताल नामक पर्यावरणविषयक जागृती करणार्या संस्थेतर्फे दरवर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित होतो. २०१८ च्या दिवाळी विशेषांकाचा विषय पारंपरिक जलसंधारण पद्धती हा होता. अंकाचे नाव 'उदक राखिले युक्तीने' (संपादक; अभिजित घोरपडे). त्यात प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची असंपादित/ संपादकीय काटछाट न केलेली आवृत्ती इथे पुनर्प्रकाशित करत आहे)
एक ओकंबोकं गाव आहे... उजाड आहे... वैराण आहे... गावाचं नाव इनामगाव. खरंतर या गावाचं मूळ नाव काय हे कुणालाच कधीच ठाऊक नाहीये. शेजारच्या इनामगावच्या शिवाराच्या हद्दीत येतं म्हणून याचंही नाव इनामगावच. पण हे गाव नेहेमीच असं उजाड ओसाड नव्हतं. खूप खूप शतकांपूर्वी, काही सहस्रकांपूर्वी इथे एक नांदतंजागतं नदीकाठाच्या आसर्याने राहणारं गाव होतं. तर त्या गावाची ही कहाणी. महाराष्ट्रातल्या, दख्खनमधल्या पहिल्यावहिल्या ज्ञात जलसंधारण तंत्रज्ञानाची कहाणी.
लिखित इतिहासकालापेक्षाही प्राचीन अशा त्या दख्खनच्या आद्य शेतकरी समाजाने मागे सोडलेल्या गावांची, वाड्या-वस्त्यांची ओळख पटवणार्या पांढरीच्या - खापरांच्या पाउलखुणा पश्चिम दख्खनमध्ये अनेको ठिकाणी उमटलेल्या दिसतात. जवळजवळ दोनशेहून अधिक वसाहतींची पुरातत्वाने आजवर नोंद केलेली आहे. १९४७ साली प्रथम प्रकाशात आलेल्या प्रवराकाठच्या जोर्वे गावच्या उत्खननापासून ते थेट अगदी अलिकडे सांगली जिल्ह्यात चिकुर्डे मध्ये झालेल्या सर्वेक्षणापर्यंत सुमारे पासष्ट सत्तर वर्षे सतत या वसाहतींवर, कालखंडावर अनेक अभ्यासकांनी संशोधन केले आहे. वीसपेक्षा जास्त ठिकाणी उत्खनने झालेली आहेत. त्यामुळे एकूणच या समाजाच्या, कालंखंडाच्या जीवनपद्धतीविषयी आपल्याला बर्यापैकी सखोल माहिती मिळालेली आहे. या माहितीत सगळ्यात मोलाची भर टाकली ती इनामगाव येथील सतत १३ वर्षे चाललेल्या उत्खननाने आणि त्याच बरोबर दायमाबाद, प्रकाश, कवठे, वाळकी आणि अशाच इतर छोट्यामोठ्या उत्खननांनी.
कसं होतं हे दख्खनमधल्या आद्य शेतकर्याचं जीवन? सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वीपासून आपल्याला या दख्खनच्या आद्य वसाहती आढळायला लागतात. सुरुवातीला बहुदा हंगामीच असणारी छोटी छोटी गावं, वाड्या पुढच्या हजार वर्षांत व्यवस्थित स्थिरावतात. पूर्ण दख्खनभर अशी अनेक स्थायी गावे, त्यांना संलग्न/ स्वतंत्र अशा हंगामी वाड्या-वस्त्या पसरलेल्या होत्या असे दिसते. नदीनाल्यांच्या काठाला, काळ्याकरंद सुपीक जमिनीच्या सान्निध्यात, चराऊ कुरणांच्या जवळपास, कधीतरी गारगोटीचे दगड जिथे विपुल प्रमाणात मिळतात त्या ठिकाणाच्या आसपास अशा विविध प्रकारच्या परिसरांमध्ये या लोकसमूहांचा वावर होता. पण दख्खनचे पर्यावरण, पाऊसमान तेव्हाही आजपेक्षा फार वेगळे नव्हते. तेव्हाही दख्खन अर्धदुष्काळीच होता. त्यामुळे बहुतेक गावं वसवताना साहजिकपणेच जलस्रोतांशी सान्निध्य हा एक महत्वाचा निकष होता असे दिसून येते. लोखंड गाळायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. तांबे आणि दगड यांची हत्यारं औजारं वापरली जात असत. म्हणूनच त्यांना पुरातत्वात ताम्रपाषाण युग असे म्हणले जाते. शेती, पशुपालन, शिकार, मासेमारी, जंगलातून फळे कंदमुळे इत्यादि गोळा करणे यावर या समाजांची उपजीविका होत असे. आपसात देवाणघेवाणही होतच असे. पार कर्नाटक आणि गुजरात राजस्थानपर्यंतच्या प्रदेशांशी यांचे देवाणघेवाणीतून संपर्क होते. मात्र नाणी नव्हती, चलनव्यवस्था नव्हती, शहरे नव्हती, राजसत्तेची चौकट नव्हती आणि बांधीव शासनयंत्रणाही नव्हती. फक्त कुटु़ंब आणि कुल यांच्या चौकटीत वावरणारे हे समाजगट होते आणि आपसातच गावप्रमुखांद्वारे कारभार चालत असे.
असे असले तरीही या गावांचीही आपसात एक उतरंडीची व्यवस्था असावी असा संशोधकांचा कयास आहे. म्हणजे काही मोठी गावे प्रादेशिक केंद्रे आणि पर्यायाने त्या त्या प्रदेशातील गावांच्या सामाजिक-आर्थिक-धार्मिक जीवनाचे केंद्र असावीत असे दिसते. ही गावे म्हणजे तापी खोर्यातील प्रकाश, गोदावरी-प्रवरा खोर्यातील दायमाबाद आणि भीमा खोर्यातील इनामगाव.
भीमेची उपनदी घोड. अगदीच तीव्र उन्हाळा सोडला तर एरवी बर्यापैकी पाणी असणारी. तिच्या एका वळणावर इनामगाव वसले आहे. पांढरीचा एकूण परिसर पंचवीस एकरांच्या आसपास. इ.स.पू. १६००च्या सुमारास इथे प्रथम माणसं कायमस्वरूपी वस्तीला आली असे दिसते. ते थेट पुढची जवळपास हजार वर्षे. किती पिढ्या आणि जीवनाच्या नदीची किती वळणे गावाने बघितली असतील ते फक्त त्या पांढरीलाच ठाऊक. आपल्याला माहित ते फक्त त्यांच्या घरांबद्दल, कारागिरीबद्दल, भांड्याकुंड्यांबद्दल; कुठली धान्ये पिकत, कुठले प्राणी पाळत, कुठली शिकार करत यांबद्दल. पुरातत्वीय तांत्रिक परिभाषेत त्याचे तीन सांस्कृतिक उपकालखंड पडतात - माळवा, पूर्व-जोर्वे आणि उत्तर-जोर्वे कालखंड. त्यातील पूर्व-जोर्वे कालखंड हा सगळ्यात भरभराटीचा सुबत्तेचा होता. थोडक्यात आढावा घ्यायचा तर कुडांच्या एक-दोन-तीन खोल्यांच्या अंगण असलेल्या घरात राहणारी ही कुटुंबे गाई-बैलांची-म्हशींची खिल्लारं आणि शेळ्या-मेंढ्यांचे कळप राखत. त्याचबरोबर डुकरं, कोंबडी, कुत्री असेही प्राणी गावात असत. दख्खनच्या पारंपरिक वैविध्यपूर्ण पीकपद्धतीचा उगम याच काळात झाला असे दिसते. जव (बार्ली), गहू, मूग, मसूर, तूर, उडीद, हरभरा, कुळीथ, वाटाणा, राळे, नाचणी अशी अशी खरीप आणि रब्बी हंगामातील विविध पिके इथे घेतली जात असत असे पुरावे सांगतात.
इनामगाव शिरूरच्या जवळ आहे. दख्खनच्या अर्धदुष्काळी पट्ट्याच्या अगदी मध्यभागी. वर्षात जेमतेम ५०० मिमि पाऊस पडतो. तोही बेभरवशी. राजस्थानमधून मिळालेले पुरापर्यावरणीय पुरावे आपल्याला असे सांगतात की त्याकाळी पश्चिम भारतात थोडा जास्त पाऊस पडत असे. पाऊसपाणी नियमित असे. अशा अनुकूल पाऊसमानामुळेच या ताम्रपाषाणयुगीन वसाहती दख्खनच्या पठारावर सर्वत्र स्थिरावू शकल्या असे संशोधकांचे अनुमान आहे. प्राचीन काळापासून नदीच्या वळणावर गावं वसवली जातात कारण अशा ठिकाणी सहसा डोह तयार होतो आणि उन्हाळ्यात इतर पाणी आटलं तरी डोह मात्र गरजेपुरतं पाणी साठवून ठेवतो. इनामगाव वसवायच्या मागेही तिथली काळी सुपीक जमीन आणि नदीचं वाकण हेच महत्वाचं ठरलेलं असणार.
मात्र इतक्या मोठ्या गावाला अर्धदुष्काळी हवामानात बेतास बात पाऊसपाण्यात तगून राहायचे असेल तर नैसर्गिक संसाधने व त्यांचे स्रोत यांचे काटेकोर व्यवस्थापन करावे लागते. विशेषतः भक्कम पाठिंबा देऊ शकणारी शहरे आणि महाप्रादेशिक शासनयंत्रणा अस्तित्वातच नसताना. अशा अर्धदुष्काळी प्रदेशांत राहणार्या प्राचीन समाजांचा अभ्यास करणार्या संशोधकांच्या मते आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुविहित शासनयंत्रणेचा अभाव असताना आदिम लोकसमूह संभाव्य टंचाईला तोंड देण्यासाठी विविध प्रकारची सांस्कृतिक धोरणे अवलंबतात. त्यात प्रामुख्याने उपजीविकेच्या मार्गांचे वैविध्य, साठवणूक, भटकंती (म्हणजे काही काळ दुसरी कडे जाऊन तिथली संसाधने वापरायची, एकाच ठिकाणच्या संसाधनांवर सतत ताण पडत नाही) आणि अन्य लोकसमूहांशी देवाणघेवाण यांचा समावेश होतो. इनामगावच्या पुराव्याकडे बघता हे चारही मार्ग इथल्या गावकर्यांनी वर्षानुवर्षे चोखाळले होते हे उघड आहे. विविध समकालीन लोकसमूहांशी देवाणघेवाणीचे संपर्क आणि उपजीविकेचे वैविध्य वरती नमूद केलेच आहे. त्या शिवाय धान्याच्या साठवणुकीसाठी मोठाल्या कणग्या, रांजण घरोघरी वापरले जात. एवढेच नव्हे तर गावाचे मिळून सार्वजनिक धान्याचे कोठारही होते आणि गावचा प्रमुख बहुदा त्याची निगराणी करत असे असेही उत्खनित पुराव्यांवरून दिसून आले आहे. शिवाय इनामगावचे काही गावकरी नियमितपणे तिथून ३२ किमी दूर असलेल्या वाळकी गावानजिक असलेल्या अतिशय सुपीक अशा जमिनीच्या पट्ट्यावर शेती करायला जात व हंगामी वस्ती करून राहात हेही वाळकी येथील उत्खननातून सिद्ध झालेले आहे.
हे सगळे खरे असले, आणि इनामगाव अर्धदुष्काळी पट्ट्यातील अगदी 'क्लासिक' असे आदिम गावाचे उदाहरण म्हणून ढळढळीत दिसत असले तरीही या सगळ्या पुराव्यांमध्ये एक थोडा विसंगत पुरावा मिळत होता. तो म्हणजे गहू. इनामगावच्या उत्खननात तांदूळ आणि वालही मिळाले होते. पण अगदीच थोडक्या प्रमाणात. त्यामुळे ते बाहेरून, जास्त पावसाच्या प्रदेशात असलेल्या गावांतून आयात केले गेले असणार, असा अंदाज सहजच बांधता येत होता. पूर्व-जोर्वे काळात गहू मात्र इथेच पिकवले जात असणार असे पुरावा सांगत होता. गहू हे रब्बी पीक आणि त्याला भरपूर पाणी लागतं, सिंचनाची व्यवस्था लागते. दख्खनमध्ये गहू होतो, पण या शिरूर-दौंडच्या पट्ट्यात कधीच नाही. तिकडे कोपरगाव परिसरात (जिथून दायमाबाद हे ताम्रपाषणयुगीन स्थळ अगदीच जवळ आहे) उत्तम काळी माती, भरपूर पाऊस म्हणून पारंपरिकरीत्या खपली, बक्षी गहू वगैरे होत असे कलोनियल रेकॉर्ड्स आपल्याला सांगतात. पण इनामगावच्या आसपास मात्र कधीच गहू झाल्याचं ऐकिवात नाही. मग इथे गहू कसा काय होत होता?
पाण्याची साठवणूक किंवा जलसंधारण आणि व्यवस्थापन याविषयी ताम्रपाषाणयुगीन वसाहतींमधून जवळजवळ काहीच पुरावा तोपर्यंत उपलब्ध नव्हता. रोजच्या वापराचे पाणी साठवण्यासाठी असलेले मोठे मोठे रांजण - जे अजूनही खेडेगावांमध्ये वापरले जातात - अनेको मिळाले होते पण त्याचा वापर हा शेतीसाठी निश्चितच होत नसणार. बरं, लोहतंत्रज्ञान अवगत नसल्याने जलसंधारण करण्यासाठी विहिरी अस्तित्वात नव्हत्या हेही उघड आहे. काळा फत्तर पहारीशिवाय कसा फोडणार? अशा विहिरी सिंधू संस्कृतीत मिळाल्या आहेत, पण तो दगडाशिवायचा नदीच्या गाळाचा मऊ मातीच प्रदेश! शिवाय दख्खनमध्ये इतक्या आधी नदीवर बांध बांधल्याचे अवशेष/पुरावे अजूनतरी उघडकीला आलेले नाहीत. तेव्हा तिथे होणारे गव्हाचे पीक हे काही काळ तरी उत्खनकांना पडलेले कोडेच होते. ते उलगडले पुढच्या काही वर्षांमधे मिळालेल्या रोचक पुराव्यांनी.
गावाच्या बाहेर काही अंतरावर दगडांचे ढिगारे उत्खनकांनी बघितले होते, ते नक्की कशाचे आहेत ते बघायला त्यांनी तिथे पद्धतशीर चाचणी उत्खनन केले. त्यातून लक्षात आले की ते गावाभोवती बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आहेत. तब्बल २४० मीटर म्हणजेच जवळपास ८०० फूट लांबीची आणि दहा फूट जाडीची ती भिंत होती. एवढेच नव्हे तर या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला जवळपास समांतर असे एक ओढ्याचे/नाल्याचे पात्र असावे असा पुरावा मिळत होता. गावपरिसराच्या सम्यक भूगोलाचा विचार करताना दिसून आले की लांब गावाच्या पूर्वेला नदी आणि उत्तरेला एक छोटा नाला आहे. आणि हे पात्र त्या उत्तरेच्या नाल्याला मिळत असणार. तसेच हे नैसर्गिक जलौघाचे पात्र नाही. एकुणात पुरावा दर्शवतो की हा मुद्दाम खणलेला कालवा आहे. जवळजवळ २८ ते ३० फूट रुंद आणि साडेतीनशे फुटापेक्षा लांब असा तो कालवा होता. शिवाय त्याचा मध्यभाग आणखी खोलगट केलेला होता. अभ्यासकांच्या मते या कालव्याची किमान संधारण क्षमता सुमारे ५४००० घनफूट पाणी साठवणुकीची होती.
घोडनदीला दरवर्षी येणारा पूर बघता उत्खनकांनी असे अनुमान केले आहे की दरवर्षीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी तो कालवा खोदून पुराचे अतिरिक्त पाणी त्यात वळवले जात असणार. आणि म्हणूनच कालवा आणि गावाच्या मध्ये दगडी भिंत बांधली गेली. या कालव्याने दोन उद्दिष्टे साध्य होत होती. एक म्हणजे पुराच्या अतिरिक्त लोंढ्याला वाट देऊन गावाच्या संरक्षणाला हातभार लावणे आणि दुसरे म्हणजे थोड्या खोलगट परिसरात असल्याने हे पावसाळ्यात जमलेले पाणी त्यानंतर काही महिने तिथे साठून राहात असणार. साहजिकच विहिरीशिवायची भरवशाची पाण्याची साठवणूक म्हणून या कालव्याचा उपयोग गावकरी करत असणार. कालवा आणि भिंतीमध्ये मिळालेल्या खापरांच्या आधारे याचा काळ पूर्व-जोर्वे कालखंड (इ.स.पू. १४००-१०००) असा निश्चित करण्यात आला.
या काळात पाऊसमान सर्वात जास्त चांगले होते असे पुरापर्यावरणीय पुरावे सांगतात. तेव्हा उत्तम पाऊसमान आणि कालव्याचे पाणी याच्याच मदतीने इनामगावच्या शिवारांमध्ये गव्हाची लागवड होत असणार हे उघड आहे. तलाव, विहिरी, कुंडे इत्यादि गावपातळीवरील जलव्यवस्थापनाचे मार्ग या गावांना लोहतंत्रज्ञानाच्या अभावी शक्य नव्हते. नागरी सिंधू संस्कृती सोडता तत्कालिन कुठल्याच समाजात ही जलसंधारण तंत्रे आढळत नाहीत. गुजरातेत साबरमतीच्या खोर्यातील तिंबर्वा, धाटवा, जोखा अशी काही ताम्रपाषाणयुगीन गावे आसपास असलेल्या खोलगट घळींमध्ये साठलेले पाणी वापरत असल्याचे अनुमान संशोधकांनी मांडले आहे. परंतु ते पूर्णपणे नैसर्गिक असे हंगामी जलस्रोत आहेत. त्या दृष्टीने इनामगावचा कालवा हे अतिशय दुर्मिळ, कदाचित एकुलते एक, असे आद्य शेतकरी समूहांच्या जलव्यवस्थापनाचे उदाहरण ठरते.
हे समाजसमूह राजसत्तेने नियंत्रित नव्हते तर ज्याला मानववंशशास्त्रात चीफडम (chiefdom) म्हणतात तसे, गावप्रमुखांच्या आधिपत्याखाली सहकारी तत्वाने जगणारे समूह होते. जन्माधारित सामाजिक भेदाभेदही इथे असल्याचा पुरावा नाही. तेव्हा अशी सार्वजनिक पातळीवरची कामे ही गावप्रमुखाने केलेल्या नियोजनावर आधारित पूर्णपणे सहकारी तत्वावर पार पाडली गेली असणार हे उघड आहे. दख्खनमधील ही आद्य पाणी-पंचायत मानायला हरकत नसावी. अशा व्यवस्था कदाचित इतरही समकालीन वसाहतींमध्ये असू शकतील, परंतु आपल्याला तसे पुरावे मिळालेले नाहीत.
मात्र इ.स.पू १००० पासून, उत्तर जोर्वे कालखंडापासून पाऊसमान बेभरवशी झालेले दिसून येते. दुष्काळाची तीव्रता आणि वारंवारता वाढायला लागली. गाळ साठून आणि अपुर्या पावसाने या कालव्याचा वापर थांबलेला दिसतो. हळूहळू तो बुजून गेला. गव्हाची लागवड आता कुणी करेनासे झाले. नाचणीसारख्या कमी पाण्याच्या पिकांवर आणि काळविटांच्या शिकारीवर भर वाढायला लागला. हळूहळू शेतीचे प्रमाण कमी होऊन पशुपालनावर गाव जास्त विसंबून राहू लागले आणि मग पाण्याच्या शोधात, चराऊ कुरणांच्या शोधात गावाबाहेर पडून अर्धभटके जीवन जगायला लागले. गाव जगायला बाहेर पडलं आणि संस्कृतीचे चक्र 'उलटे' फिरून परत एकदा भटके जीवन समाजाने स्वीकारले.
पुढची चारपाचशे वर्षे आपल्याला दख्खनमध्ये फारशा वसाहती मिळत नाहीत. मग सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परत एकदा पाऊसमान सुधारते, दख्खन हजारो गावांनी, शहरांनी फुलून उठतो. सातवाहनकालीन शहरीकरणाबरोबर आता लोहतंत्रज्ञानाचाही सर्वत्र शिरकाव येथे होतो. आणि मग साहित्यात, शिलालेखांत विहिरी-तलाव-बांधबंधारे-टाकी यांचे उल्लेख आढळायला लागतात. बौद्ध लेण्यांमध्ये पुण्य कमवायला म्हणून अनेकांनी दान देऊन दगडात कोरून घेतलेल्या पोढि किंवा टाकी दिसू लागतात. आपण ज्याला पारंपरिक जलसंधारणाचे मार्ग म्हणतो त्याचा उदय पहिल्यांदा या काळात दिसतो.
मात्र इनामगावची पांढर ओसाडच राहिली. परत तिथे कधीच माणूस वसला नाही. तिथले गावकरी कुठे पांगले, भटकत भटकत कुठे गेले, सातवाहनकाळात त्यांचे वंशज समाजात कसे मिसळले हे आजही आपल्यासाठी अज्ञातच आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी केलेला दख्खनचा पहिल्या पाणी-पंचायतीचा प्रयोग विस्मृतीच्या नदीत विलीन झाला.
आजही इनामगावच्या पांढरीवर उभं राहिलं की अर्धदुष्काळी - गाव सोडून जगायला बाहेर पडायला लावणारा - दख्खन म्हणजे काय हे आसपासच्या परिसरावरून नीटच उमजतं. पण त्याचवेळी आपल्या पायाखाली बुजलेला कालवा असतो. प्रगत तंत्राची उपलब्धता नसतानाही चिवटपणे माणसांनी पर्यावरणाशी मिळतंजुळतं घेऊन जीवनाचा ओघ वाहता ठेवण्याच्या अदम्य धडपडीचे प्रतीक! संस्कृती आणि तंत्रज्ञान म्हणजे तरी आणखी काय वेगळं असतं?
प्रतिसादांबाबत सगळ्यांना धन्यवाद.
@ ShashankP - इनामगावची पांढर आजही अस्तित्वात आहे, तिथे जायला कुणालाच मज्जाव नाही. पण तिथे आता उत्खननाच्या खुणा शिल्लक नाहीत. फक्त वरती खापरे व इतर पुरावशेष मिळतात. इनामगाव उत्खननातून मिळालेले सर्व महत्वाचे पुरावशेष पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वस्तुसंग्रहालयात बघायला मिळतील. @ चिडकू - तुमच्या माहितीबद्दल फार आभारी आहे. याचाच अर्थ हे तंत्रज्ञान गेले साडेतीन हजार वर्षे दख्खनमध्ये वापरले जात होते. परंतू त्याची जाणतेपणाने नोंद घेतली गेली तर नाहीच पण राजस्थानात जसे जोहडवर काम झाले तशा पद्धतीने या व्यवस्थांचे पुनरुज्जीवनही झाले नाहीये. महाराष्ट्रात ज्या काही छोट्यामोठ्या स्थानिक पारंपरिक जलसंधारण पद्धती होत्या त्याचं डॉक्युमेन्टेशन व्हायची फार गरज आहे. भवताल ही संस्था सध्या हे काम करत आहे. जर या भागात अशी व्यवस्था अजूनही कुठे शिल्लक असेल तर तुम्ही त्यांना फेसबुकवर कळवू शकाल. @आशुचॅम्प, लसावि - फोटो उत्खनन अहवालात आहेत पण काळे पांढरे आहेत आणि त्यातून काहीही बोध होण्यासारखा नाहीए - फक्त दगड आणि माती दिसत आहेत - एक आरेखन आहे माझ्याकडे कुठेतरी पण आत्ता सापडत नाहीये. उत्खनन अहवालात जो आरेखन नकाशा आहे तो जमलं तर इथे टाकेन - त्यात थोडा अंदाज येईल @हीरा - घडीव, चिर्याचे दगड अर्थातच वापरले नव्हते. कारण लोखंडी औजारे उपलब्ध नव्हती. एरवीचे दगडच मातीचं/चिखलाचं लिंपण करून बसवले होते. चुना त्यांना माहित होता, इनामगावात चुन्याचे उत्पादन करणारे लोणारीही होते असं पुरावा आपल्याला सांगतो पण या बांधकामात चुना वापरलेला आढळून आलेला नाहीये. ते शेततळे नक्की नव्हते. कालवाच होता. बर्याच अंतरा पर्यंत ट्रेस केला गेला आहे. खणाखणी अर्थातच कठीण टोकेरी दगडी हत्यारांनी झालेली असणार
नगरच्या या नदीकाठी अश्मयुगीन मानव राहत असल्याचे पुरावे सापडलेत
6–8 minutes
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही इतिहासाशी निगडीत असते. मात्र हे पण हे लक्षात घ्यायला हवे की इतिहास म्हणजे काही नुसत्या सनावळ्या आणि लढायांची जंत्री नाही. या इतिहासाला देखील एक इतिहास होता, तो म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा. मानवी वस्त्यांचे अवशेष आपल्याला संपूर्ण मानव जातीचा इतिहास आणि संस्कृती सांगत असतो.
आपल्याला आजकालच्या शाळेमध्ये विशेषतः इयत्ता ३ री च्या पुस्तकामध्ये अश्मयुगीन माणसाची माहिती दिलेली आढळते. मुले अभ्यासामध्ये अश्मयुग, नवअश्मयुग, ताम्रपाषाणयुग वगैरे शब्द पाठ करतात दगडाच्या कुऱ्हाडीची, रापींची, चित्रे पुस्तकात पाहतात. परंतु पुस्तकातील दगडी ह*त्यारांची केवळ चित्रे न बघता प्रत्यक्ष दगडी कुऱ्हाड जर पाहिली तर त्या शाळेतील मुलांना प्राचीन मानवी इतिहासाबद्दल माहिती समजायला फक्त मदतच होत नाही तर त्याबद्दल जिज्ञासा देखील निर्माण होते. तसेच जर या विद्यार्थ्यांना एखाद्या कोरड्या नदीच्या पात्रात अभ्यासाला नेले तर या विद्यार्थ्यांना देखील प्राचीन मानवी वसाहतीचे पुरावे पाहायला मिळतील आणि प्राचीन मानवाच्या वस्तीची स्थाने कशी पाहतात हे कसे ओळखायचे याबाबत नक्की माहिती मिळेल.
अशाच प्राचीन मानवाच्या नदीपात्रातील वस्तींची माहिती घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील नद्यांचे महत्त्व किती आहे याबाबत जाणून घेणे फार महत्वाचे ठरेल.
प्राचीन मानवी संस्कृतीच्या खुणा दर्शवणारा माठ यावरील प्राचीन मानवाने केले रंगकाम दिसून येते.
महाराष्ट्राची भौगोलिक रचना जर पहिली तर तिचे मानवाच्या संस्कृतीच्या विकासामध्ये योगदान आपल्याला दिसून येते. मानवी शरीरात जशा धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात त्याच प्रकारे महाराष्ट्रातील नद्या महाराष्ट्राचे पोषण करतात. महाराष्ट्रातील नद्यांचे योगदान मानवाच्या विकासासाठी फार मोठे कारण आहे.
याच नद्यांच्या काठावर मानवी संस्कृती स्थिर झाली आणि याच महाराष्ट्रातील नद्यांच्या काठाला लहान मोठी नगरे उभी राहिली. ऋग्वेदामध्ये सिंधू, सरस्वती यांसारख्या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केलेले आपल्याला आढळते.
मानवी संस्कृतीचा अभ्यास करायचा असेल तर या नद्यांचा देखील अभ्यास करणे फार महत्त्वाचे ठरते तसेच त्या नदीकाठी वसलेल्या किंवा विकसित झालेल्या वसाहतींचा अभ्यास करणे हे देखील महत्त्वाचे असते.
आजपर्यंत मानवी संस्कृतीचा अभ्यास करताना बरीचशी ठिकाणे ही पुरातत्वीय अभ्यासकांना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सापडली आहेत त्यातील बहुतांश ठिकाणे नदीकाठी सापडलेली आहेत. भारतामधील नदीच्या काठी वसलेल्या संस्कृतीची उत्तम उदाहरणे म्हणजे प्राचीन सरस्वती नदीकाठी वसलेले कालीबंगन येथे ‘घग्गर’ संस्कृतीचे अवशेष सापडलेले आपल्याला बघायला मिळतात.
आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरूरजवळ असणाऱ्या ‘इनामगाव’ येथील घोडनदीच्या काठावर झालेल्या उत्खननात ‘माळवा संस्कृती’, ‘पुर्वजोर्वे संस्कृती’ अशा ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील विविध स्तर उत्खननात सापडले. महाराष्ट्रातील प्रवरा ही एक अत्यंत महत्त्वाची नदी. याच प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये नेवासा, दायमाबाद तसेच जोर्वे येथे अश्मयुगीन आणि ताम्रपाषाणयुगीन वसाहतीचे पुरावे उत्खननातून मिळाले. हे उत्खनन प्राचीन मानवी वसाहती महाराष्ट्रात होत्या याचे फार मोठे पुरावे उपलब्ध करून देते.
प्राचीन मानवाचा पुनर्जन्मावर फार विश्वास होता हे वरील दोन माठांच्यावरून दिसून येते या वरील माठांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींचे शरीर ठेवून पुरत असत.
प्रवरा नदी नगर जिल्ह्याची जीवनदायिनी. अनेक छोटीमोठी गावे या प्रवरा नदीच्या काठावर वसलेली आहेत. मुळात नगर जिल्ह्याचे वैशिष्ट्य असे आहे की गोदावरीच्या खोऱ्यामधील प्रवरा नदी आणि कृष्णा खोऱ्यामध्ये असणारी सीना नदी या दोन्ही नद्या या एकाच जिल्ह्यातून वाहतात.
या नद्यांच्या काठी मानवी संस्कृती वसत गेली आणि मानवाचा विकास होत गेला हे आपल्याला या नद्यांच्या काठावर आढळणाऱ्या मानवी वसाहतींच्या अवशेषांवरून समजते. प्रागैतिहासिक काळापासून या संपूर्ण खोऱ्यामध्ये विविध संस्कृती नांदल्या आणि विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रात उदयाला आल्या असे आपल्याला दिसते.
अश्मयुगात माणूस भटक्या अवस्थेत होता. त्या काळामध्ये माणूस पाण्याच्या आश्रयाने राहत असे आणि आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या दगडांची तो ह*त्यारे करीत असे, जुनी झालेली ह*त्यारे तेथेच टाकून तो स्थलांतर करत असे. या टाकलेल्या ह*त्यारांवर पावसाळ्यात नदी आपला गाळ जो वाहून आणते त्याचा थर या ह*त्यारांवर बसायला लागला की ही ह*त्यारे नदीपात्रातील मातीमध्ये बुजून जातात. जसजसा नदीचा गाळ कालांतराने वाहून जातो किंवा नदीपात्र हे शुष्क बनते तसे हे लपले गेलेले ह*त्यारे आणि प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा दिसू लागतात.
प्राचीन मानवी वसाहतीच्या जागा या बऱ्याचश्या गावांमध्ये ‘पांढरी किंवा पांढर’ या नावाने प्रसिद्ध असतात. या पांढरी बऱ्याचदा नदीपात्रालगत असतात आणि या पांढरीचा थर मात्र नेहमीच्या मातीपेक्षा खूप वेगळा असतो. या पांढरीच्या टेकडामुळे बऱ्याचदा आपल्याला प्राचीन मानवी संस्कृतीचे धागेदोरे सापडायला मदत होते.
प्राचीन माणसाने तयार केलेल्या भांड्याच्या विविध वस्तू.
प्राचीन मानवी संस्कृतीचे धागे दोरे सापडण्यात जशी प्राचीन मानवी ह*त्यारे मदत करतात तसेच मातीची खापरे देखील फार महत्वाची ठरतात. इतर धातूची भांडी ही कालौघात नष्ट होतात परंतु मातीची भांडी आणि त्यांची खापरे वर्षानुवर्षे तशीच राहतात. म्हणून या मातीच्या खापरांना आत्यंतिक महत्त्व आहे.
या मातीच्या खापारांवरून आपल्याला प्राचीन मानवी वसाहतींचा काळ निश्चित करता येतो.
या विविध मानवी संस्कृती या महाराष्ट्रातील नदीकाठी नांदत होत्या, त्याचे पुरावे या महाराष्ट्रातल्या नद्या आपल्याला देतात आणि मानवी संस्कृतीच्या विकासाच्या पाऊलखुणा या आपल्याला धुंडाळणे फार महत्त्वाचे ठरते, कारण यातून आपल्याला प्रागैतिहासिक मानवाची प्रगती समजते आणि नदीकाठच्या प्राचीन संस्कृतीतून आजच्या मानवाच्या प्रगतीची झलक दिसून येते.
महाराष्ट्रात ज्या मोठ्या प्राचीन संस्कृती आढळल्या आहेत त्यांची नावे. (नकाशा आंतरजालावरून घेतला आहे.)
सदर लेख महाराष्ट्राची शोधयात्रा वर पूर्वप्रकाशित.
प्रकरण-३ रे
भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव - वसाहती
भारतात ज्या कालखंडातील हत्यारे व उपकरणांसाठी पाषाणाबरोबरच प्रथम तांब्याचा
उपयोग होऊ लागला, या कालखंडाला ‘ताम्रपाषाणयुग’ असे म्हटले जाते.
या कालखंडात तांबे वितळवण्याचे तंत्र भारतातील मानवाने चांगलेच आत्मसात केलेले होते.
या कालखंडात तांब्याच्या कुऱ्हाडी, छिन्न्या आणि अनेक प्रकारचे छोटी शस्त्र तयार झालेले आहेत.
याशिवाय तांब्याचे अनेक उपकरणे आणि अलंकारही उत्खननात सापडले आहेत.
या कालखंडात तांब्याची व मातीची भांडी आढळतात.
ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणजे तांबे आणि दगड या दोहोंची हत्यारे वापरणार्या लोकांची संस्कृती होय.
नैसर्गिक आपत्तीमुळे हडप्पा संस्कृती काळातील लोकांना स्थलांतर करावे लागले. ते लोक जेथे नव्याने वसले, तेथे गाव-वसाहती या स्वरुपात नवीन संस्कृती उदयाला आल्या.
या नवीन संस्कृतीचा प्रसार भारतात राजस्थान, गुजरात,बिहार,बंगाल,ओरिसा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गंगेचे खोरे या प्रदेशात झाला.या संस्कृतीना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती म्हणतात.
उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोक जेथे जेथे पोहोचले तेथे स्थानिक संस्कृतीमध्ये ते मिसळून गेले.
या ठिकाणी भांडी घडवणे, तांब्याच्या वस्तू बनवणे, शेती करणे या गोष्टींचे स्थानिक लोकांना ज्ञान दिले.
त्यातून प्रादेशिकतेनुसार वैशिष्ट्यांचे वैविध्य दर्शविणाऱ्या वसाहतींच्या स्वरूपातील नवीन संस्कृती उदयाला आल्या.
ग्राम-वसाहतीच्या रचनेत नागरी हडप्पा काळातील शिस्त दिसत नाही.
हडप्पा येथील ‘एच’ या दफनस्थळातील मिळालेल्या अस्थीकुंभावरील नक्षीचे नमुने हे वेगळ्या प्रकारचे आहेत.
त्यामध्ये चंद्र,सूर्य,मासे, हरीण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला दिसतो.
अस्थीकुंभावरील मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे.
उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक आर्य होते,असे काही पुरातत्वज्ञाचे मत आहे,पण हे लोक निश्चित कोण होते, हे ठरविण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.
राजस्थान --
‘आहाड’ किंवा ‘बनास’ संस्कृती--(टीप लिहा.)
राजस्थानमधील मेवाड प्रदेशातील ही संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन संस्कृती आहे.
तिचा कालखंड इ.स.पू. ४००० इतका प्राचीन आहे.
उदयपूर जवळच्या आहाड येथे सर्वप्रथम तिचा शोध लागला, म्हणून तिला आहाड संस्कृती असे म्हणतात.
आहाड संस्कृतीला ‘बनास संस्कृती’ असेही म्हणतात; कारण ही संस्कृती बनास नदीच्या उपनदीवर वसलेली आहे.
बालाथल आणि गिलुंड ही या संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत.
बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते.
त्याचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर गाव- वसाहतींना केला जात होता.
आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यांमध्ये काळी आणि तांबडी भांडी महत्वाची आहेत.ती चाकावर घडवलेली असत.त्यांचा आतील भाग आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असे.
मातीच्या भांड्याबरोबरच मातीचे बैल, शंखांच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अग्रे, तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात मिळाल्या.
बालाथल येथील घरे पक्क्या विटांची (इंग्लिश बॉण्ड पद्धत) बांधली होती.
बालाथलभोवती तटबंदी होती. हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचा पुरावा आहे.
हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत,असे दिसते.
तांबे वितळवून ते शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते.
राजस्थानातील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून हे लोक तांबे मिळवत होते.
गणेश्वर-जोधपुरा संस्कृती-
गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक स्थळे राजस्थानातील खेत्री परिसरात सापडले आहेत.
या गाव-वसाहती हडप्पापूर्व काळातील होत्या.
गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याचे बाण आणि भाले यांचे अग्रे, मासेमारीचे गळ,बांगड्या, छिन्न्या यासारख्या वस्तू आणि आणि मातीची भांडी मिळाले.
गणेश्वर-जोधपुरा संस्कृतीचे लोक हडप्पा संस्कृतीच्या लोकांना तांब्याच्या वस्तू पुरवत असत.
गंगेचे खोरे-
गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी-
गेरू रंगाच्या भांड्यांची खापरे नदीच्या पात्रात सापडतात. सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडतात.
या संस्कृतीची स्थळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडतात.
राजस्थान-
गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या संस्कृतीचा राजस्थानातील काळ इ.स.पू. 3000 वर्षे इतका प्राचीन आहे.
गंगा-यमुना या नद्यांच्या दुआबात इ.स.पू. 2000 च्या सुमारास नांदत होती.
या काळातील लोक स्थिर गाव-वसाहतीमध्ये राहत होते. त्यांची घरे, घरातील जमिनी चोपून तयार केलेल्या आहेत.
त्या घरांच्या आतमध्ये चूली, मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरुपी बाहुल्या, बैल गाईगुरांची हाडे, तांदूळ ,सातू यासारख्या वस्तू सापडल्या.
यावरून या संस्कृतीचे लोक स्थिर गाव- वसाहतींमधून राहत होते आणि ते शेती करत होते, हे स्पष्ट होते.
भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, ओडिसा आणि मध्य प्रदेश येथे मिळाले आहेत.
ताम्रनिधीमधील वस्तूंचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते, हे स्पष्ट आहे.
गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात सापडतात.
त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगाच्या भांड्याच्या संस्कृतीचे होते, असे मानले जाते.
ही संस्कृती उत्तर हडप्पा संस्कृती काळातील स्थलांतरित लोकांची आहे, असे काही पुरातत्वज्ञांचे मत होते.
तर काही पुरातत्त्वज्ञ गंगा-यमुना नद्यांच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधींचा संबंध वैदिक आर्यांशी जोडतात.
या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सान्निध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी, असाही एक मतप्रवाह आहे.
बंगाल, बिहार, ओडिसा-
प्रश्न- हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते. ( तुमचे मत नोंदवा)
बंगाल, बिहार, ओरिसा आणि मध्य प्रदेशामध्ये ताम्रनिधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी या प्रदेशांमध्ये मिळत नाहीत.
या राज्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींची स्थळे उजेडात आली आहेत.
बिहारमधील चिरांड, सोनपूर येथील उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळाली.
या भांड्यांचे घाट (बनावट) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या घाटांसारखे आहेत.
हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात या लोकांनी बंगाल, बिहार,ओडिसा या प्रदेशात स्थलांतर केले.
ताम्रपाषाण संस्कृतीचे मूलभूत लक्षण म्हणजे गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी होय.
शिवाय बंगाल आणि ओडिसातील ताम्रपाषाणयुगीन स्थळांमधील मातीच्या भांड्यांवर हडप्पा संस्कृतीचा प्रभाव आहे.
त्यामध्ये वाडगे, कुंडे यांची घडणही हडप्पा संस्कृतीशी साम्य दर्शवणारी आहे.
यावरून असे अनुमान काढले जाते की, हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोहोचले होते.
मध्य प्रदेश : कायथा संस्कृती -
मध्य प्रदेशातील कायथा जि.उज्जैन येथे या संस्कृतीचे अवशेष सर्वप्रथम सापडले, म्हणून तिला कायथा संस्कृती म्हणतात.
कायथा संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. याचा शोध प्रसिद्ध पुरातत्त्वज्ञ डॉ. वाकणकर यांनी लावला.
कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते.
हे लोक प्रामुख्याने हाताने बनवलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सुक्ष्मास्त्रे वापरत होते.
याशिवाय कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या, मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार सापडले.
याशिवाय संगजिरा (steatite) या दगडाच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी सापडले.
यावरून कायथा आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्परसंबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा,असे दिसते.
कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्यप्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्यप्रदेशात एकत्र नांदल्या असण्याचीही शक्यता आहे.
त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात.
माळवा संस्कृती- (टिप लिहा)
माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला.
या संस्कृतीचा कालखंड इ.स.पूर्व १८०० ते १२०० इतका आहे.
नर्मदा नदीतीरावरील नावडाटोली हे या संस्कृतीचे महत्त्व जास्त आहे.
याशिवाय मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण, उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्वाची स्थळे आहेत.
नागदा आणि एरण येथील माळवा संस्कृतीच्या गाव-वसाहती तटबंदीयुक्त होत्या.
या लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस असत.
गुजरात -
प्रश्न- गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. मुद्दे-१. कालखंड २. व्यवसाय ३. विस्तार ४. इतर संस्कृतींची आलेल्या संबंधाचा पुरावा.
गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन गाव-वसाहतींचा काळ हडप्पा संस्कृतीचे समकालीन आहे. त्यामध्ये -
कालखंड--
१. पूर्व हडप्पा इसवी सन पूर्व ३९५० -२६००
२. नागरी हडप्पा इ.स.पू.२६०० -१९००
३. हडप्पा संस्कृतीच्या नाशानंतर हडप्पोत्तर काळ.
या हडप्पा संस्कृतीच्या तिनही काळाशी मिळताजुळता आहे.
व्यवसाय -
गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या मातीच्या भांड्यांमध्ये कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते.
गुजरातमध्ये गारगोटीच्या खड्यांपासून रंगी-बेरंगी मणी बनवणे, हा हडप्पा संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता.
गाव वसाहतींमधून मण्यांसाठी कच्चा माल मिळवणे. मातीची नक्षीदार भांडी बनवणे.
शेतीतून अन्नधान्य पिकवणे.
यासारखे व्यवसाय ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या काळात गुजरातमध्ये अस्तित्वात असावे, असे दिसते.
विस्तार -
गुजरातमधील या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार कच्छ-सौराष्ट्र, उत्तर गुजरात अशा विस्तीर्ण प्रदेशात झालेला होता.
इतर संस्कृतींशी आलेल्या संबंधाचा पुरावा -
या संस्कृतीचा संबंध दक्षिण सौराष्ट्रातील ‘प्रभाव संस्कृती’ आणि ईशान्य सौराष्ट्रातील ‘रंगपुर संस्कृती’ यांच्याशी होता.
उत्तर हडप्पा काळात दक्षिण सौराष्ट्रात प्रभास जि. जुनागड येथे प्रभास संस्कृती, तर ईशान्य सौराष्ट्र रंगपूर जि. लिम्बडी येथे रंगपुर संस्कृती उदयाला आली.
या दोन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्यांचे रंग, नक्षी, घाट याबाबतीत साम्य होते.
या संस्कृती इसवी सनापूर्वी १८०० - १२०० या काळात अस्तित्वात होत्या.
ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र -
महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोहोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे.
हडप्पा संस्कृतीचे लोक तिथे पोहोचण्याआधीच्या काळात तिथे जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती, तिला सावळदा संस्कृती म्हणतात.
त्यानंतरच्या काळात तेथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीचे अवशेष मिळालेले आहेत.
सावळदा संस्कृती -
धुळे जिल्ह्यात तापी नदीच्या काठी हे स्थळ आहे.
सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सनापूर्वी सुमारे २००० -१८०० असा होता.
या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा.
कारण धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू महाराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांची असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे.
दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते.
त्या भांड्यांवरील नक्षीमध्ये तीराग्रे ,माशांचे गळ, विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता.
याशिवाय तांब्याच्या वस्तू, हाडांपासून बनवलेली तिराग्रे,खड्यांचे मणी ,दगडी पाटे-वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या.
त्यांच्या गाव-वसाहतींभोवती तटबंदी बांधलेली होती. त्यांची घरे मातीची असून, घरातील जमिनी गाळ आणि माती एकत्र चोपून बनवलेल्या होत्या.
माळवा आणि जोर्वे संस्कृती : महाराष्ट्राचे आद्य शेतकरी -
प्रश्न- माळवा संस्कृतीच्या लोकांना ‘महाराष्ट्राचे आद्य शेतकरी’ म्हटले जाते. (सकारण स्पष्ट करा.)
महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांच्या गाव-वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या.
इसवी सनापूर्वी १६०० च्या माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहोचले.
माळवा संस्कृतीच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती वसविल्या.
हे शेतकरी शेतीत गहू, बार्ली, ज्वारी अशी पिके घेऊ लागले.
त्यामुळे माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते.
महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी
आला .
त्यामुळे सावळदा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचे तंत्रज्ञान, घाट नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले आणि जोर्वे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती उदयास आली.
अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे येथे हे संस्कृती प्रथम उजेडात आली. म्हणून तिला जोर्वे संस्कृती असे म्हणतात.
महाराष्ट्रात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचा विस्तार तापी, गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्यात झाला होता.
इनामगाव,ता.शिरूर, जि. पुणे. येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोर्वे संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध झालेली आहे.
१. माळवा संस्कृती--- इ.स.पू.१६०० -१४००
२. पूर्व जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१४०० -१०००
३. उत्तर जोर्वे संस्कृती-- इ.स.पू.१००० -७००
उत्खनित स्थळे-
दायमाबाद,प्रकाशे, जिल्हा नंदुरबार, चांडोली, सोनगाव, इनामगाव, वाळकी जिल्हा पुणे, नेवासे जिल्हा अहमदनगर, पिंपळदर जिल्हा नासिक,
माळवा संस्कृती ( इ.स.पू.१६००-१४०० )
या काळातील लोकांची घरे--
लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस होती. घराच्या भिंती कुडाच्या असत.
घरामध्ये आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत.
जमिनीतून गोल खड्डा करून झोपड्या( गर्तावास ) उभारल्या जात.
धान्य साठवण व्यवस्था--
कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा,चार पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड आणि चून्याने लिंपलेले बळद यासारख्या गोष्टीवरून घरामध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते.
मातीची भांडी-
मातीची भांडी पिवळसर रंगाची असत. त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असे. त्यांचा पोत खरबरीत असतो.
पूर्व जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१४००-१०००)
या काळातील लोकांची घरे-
घरे चौकोणी, प्रशस्त, एकापेक्षा अधिक खोल्यांचे होते. गोल खड्डा करून त्यावर उघडलेल्या झोपड्यांची (गर्तावास) संख्या नगण्य होती.
गाव प्रमुखाचे मध्यवर्ती जागेत पाच खोल्यांचे घर होते.
मातीची भांडी--
त्या काळातील भांडी खणखणीत भाजलेली असल्यामुळे त्यांचा नाद धातूच्या भांड्याप्रमाणे असतो.
त्यांचा रंग लाल असतो आणि काळ्या रंगाने नक्षी काढलेली असते.
मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे आणि कुंडे, चंबु, घडे अशा घाटाच्या भांडयांचा समावेश होता.
या काळातील कुंभकाराच्या भट्ट्या गोल आकाराच्या होत्या. त्यांची क्षमता जास्त होते.
इनामगाव हे इतर गावांना मातीची भांडी पुरवणारे केंद्र होते.
पूर्व जोर्वे काळात इनामगावमध्ये नदीला कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती.
सिंचनासाठी वापर होत असे. गाव प्रमुखाकडे पाणीवाटपाचे अधिकार होते. गाव प्रमुख पद वंशपरंपरागत होते. हे दर्शवणारी दफणे प्रमुखाच्या घरालगत सर्वसाधारण दफना पेक्षा वेगळ्या पद्धतीची होती.
धान्य साठवण व्यवस्था-घराच्या बाहेर बरीच बळदे होती.येथील शेतकरी गहू,बार्ली, ज्वारी, मसूर, कुळीथ यासारखी पिके घेत होते.
दफनपद्धती- प्रमुखाची दफने घरालगतच वेगळ्या पद्धतीची होती.
साधारणत: जमिनीत खड्डा खणून मृत व्यक्तीला उताण्या अवस्थेत पुरले जाई. तर कधी मृत व्यक्तीला एका चार पायाच्या, फुगिर पोटाच्या रांजणात बसलेल्या अवस्थेत पुरले जाई.
दोन पद्धतीने दफन केले जाई. मृत बालकाला पुरण्यासाठी कुंभाचा वापर करत असत.
उत्तर जोर्वे संस्कृती ( इ.स.पू.१००० -७०० )-
या काळातील लोकांची घरे- या काळात हवा शुष्क होऊ लागली, त्यामुळे लोकांना फिरस्ते जीवन जगावे लागले.
परिणामी घराऐवजी झोपड्यांची संख्या वाढली. त्या गर्तावासाहून वेगळ्या होत्या.टोकाला बांधलेला जुडगा तळाकडे पसरून तंबूप्रमाणे शंक्वाकृती झोपड्या होत्या.
मातीची भांडी- पूर्व जोर्वे संस्कृती काळासारखे भांड्यांचे घाट असले तरी त्यावर फारसे नक्षीकाम नव्हते.
कुंभाराचे आवे( भट्ट्या) जमिनीवरच रचले जात.
भारतातील महापाषाण युग -
प्रतिकूल हवामानामुळे उत्तर जोर्वे काळात म्हणजे इ.स.पु. ७०० च्या काळात इनामगाव पूर्णपणे उजाड झाले.
जोर्वे
वसाहत अश्मयुगीन मानवाची
- केतन पुरी
नेवासा म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वास्तव्यानं पावन झालेली भूमी. इथंच ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती झाली. या घटनेची साक्ष असलेला ‘पैस खांब’ आजही भाविकांच्या मनात श्रद्धेची ज्योत अखंडपणानं चेतवत उभा आहे. नेवासा पवित्र स्थळ आहे. गावात असणारी दुसरी आकर्षक धार्मिक वास्तू म्हणजे मोहिनीराज मंदिर.
पण, फार कमी लोकांना माहीत आहे, की महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या सर्वांत पहिल्या मानवाचं अस्तित्व या गावात होतं. नेवासा अश्मयुगीन मानवाच्या वसाहतीचं ठिकाण आणि अतिशय महत्त्वाचं पुरातत्त्वीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
भारतीय पुरातत्त्वचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. ह. धी. सांकलिया यांना एका प्रश्नाची उकल होत नव्हती. भारतात अनेक ठिकाणी पुरातत्त्वीय स्थळांचे शोध लागत होते, शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणांचं उत्खनन होत होतं.
उत्तर तसेच दक्षिण भारतात आदिमानवाच्या पाऊलखुणा आढळत होत्या. पण महाराष्ट्रात मात्र अशा ठिकाणाचा शोध सुरूच होता. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशसारख्या ठिकाणी आदिमानवाच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे उपलब्ध झाले होते.
पण, रामायण काळापासून कायम चर्चेत राहिलेला भाग, मात्र आदिमानव तिथं राहत होता का, याविषयी इतिहास अनभिज्ञ होता. महाराष्ट्र या नावाचा सर्वांत पुरातन लिखित स्वरूपातील उल्लेख सापडतो उत्तर कर्नाटकाच्या ऐहोळे गावात, तिथल्या मेगुती मंदिरावर असलेल्या शिलालेखात.
त्याआधीपासून महाराष्ट्रात मानवी वस्ती होती. पण त्या मानवाच्या अस्तित्वाचं स्वरूप काय होतं, याविषयी अभ्यासक निरनिराळे तर्क लावत, अंदाज बांधत असत. नेवासा गावापासून काही किलोमीटरवर वाहणाऱ्या चिरकी ओढ्याच्या काठी पांढरीचं टेकाड असल्याची बातमी समजली. हा चिरकी ओढा प्रवरा नदीला जाऊन मिळतो.
पुरातत्त्व संशोधकांचा एक समूह त्या जागी गेला. तिथं जमिनीवर आढळणाऱ्या काही पुरावषेशांचा अभ्यास करून उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळं दख्खनच्या इतिहासाचं संपूर्ण स्वरूप बदललं.
या ठिकाणी डॉ. सांकलिया सरांच्या मार्गदर्शनाखाली १९५० ते ६० या दशकात शास्त्रीय पद्धतीनं उत्खनन करण्यात आलं आणि महाराष्ट्रातील आद्य मानवाच्या खुणा हाताशी लागल्या. आद्य पुराश्मयुगातील मानवाच्या अस्तित्वाचे धागेदोरे सापडले.
त्यामध्ये काही दगडी हत्यारं सापडली. दगडी हत्यारं बनवण्यासाठी लागणारा सर्वांत उत्तम प्रकारचा दगड म्हणजे गारगोटी. उत्तर भारतात तो विपुल प्रमाणात उपलब्ध होता. त्यापासून दगडी हत्यारे तयार करणं, त्यांना आकार देणं, वापर व्यवस्थित होईल अशी धार तयार करणं या दगडावर सोपं जाई. महाराष्ट्रात सर्वत्र बेसाल्ट.
त्याला धार लावणं किंवा त्यापासून दगडी हत्यार बनवणं, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य न होणारी गोष्ट होती. पण त्या वेळेच्या मानवाला दगडांचं उत्तम ज्ञान होतं. जमिनीतून निघालेला लाव्हारस थंड झाल्यावर त्याच्या भिंती बनत असत. त्यांना आपण डाईक असं म्हणतो. हे आकारानं लांब, पसरट पण चपटे असत. त्यामुळं त्यांचा वापर करून महाराष्ट्रातल्या अश्मयुगीन मानवानं दगडी हत्यारं केली.
नेवासा इथं उत्खनन करण्यात आलं, तेव्हा या डाईक पासून बनवलेली बरीच हत्यारं उपलब्ध झाली. भारतात मानवाचं अस्तित्व लाखो वर्षांपासून आहे. त्या वेळेचा मानव हा दगडी हत्यारं तयार करत असे. त्यांच्या साहाय्यानं तो तोडणं, कापणं, भोसकणं, तुकडे करणं, छिद्र पाडणं यांसारख्या गोष्टी करत असे.
नेवासा इथं तशाच स्वरूपाची हत्यारं सापडली. दगडी हत्यारांना घडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रावरून आणि त्यांच्या आकारावरून त्या त्या काळाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. नेवासा येथे सापडलेल्या दगडी हत्यारांवरून महाराष्ट्रात अस्तित्वात असणारा पहिला मानव हा आद्य पुराश्मयुगीन काळातील आहे, हे सिद्ध झालं.
चिरकी ओढ्याकाठी झालेल्या या उत्खननानं महाराष्ट्राचा इतिहास लाखो वर्षे मागं गेला आणि सोबतच, अनेक नवीन पुरातत्त्वीय स्थळांचा शोध घेण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. पण या पहिल्या मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध झाले असले,
तरीही त्याची शरीररचना कशी असावी याविषयी उत्तर देण्यासाठी एकही मानवी सांगाडा सापडला नाही. उत्खनन केल्यामुळं या जागेचा आदिमानव ते मध्ययुगीन कालखंडपर्यंतचा नेवासा पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पुरातत्त्वीय संशोधनाच्या आधारे मांडणं सोपं गेलं.
आद्य पुराश्म, मध्य पुराश्म, नवाश्म यांसारख्या मानवी विकासाच्या टप्प्यांचा शोध या उत्खननातून लागला. पुढं, १९६०-७० मध्येही या ठिकाणी उत्खनन करण्यात आलं. अश्मयुगीन काळातील दगडी हत्यारं,
मानव शेती करू लागला त्या काळातील खापराची भांडी, चूल, धान्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेली मोठमोठाली भांडी, मणी, बांगड्या, तांब्यापासून बनवण्यात आलेल्या वस्तू यांसारख्या अनेक मौल्यवान वस्तू प्राप्त झाल्या.
महाराष्ट्रात शेती होऊ लागली, तेव्हा मानव एका जागी स्थिर झाला. त्याचं दैनंदिन आयुष्य एकाच जागेभोवती फिरू लागलं. त्या वेळेस झालेल्या दफनांमुळं आपल्याला त्या शेती करणाऱ्या आद्य शेतकऱ्यांचे मानवी सांगाडे उपलब्ध झाले आहेत.
पण, त्याच्याही आधी वास्तव्य करणाऱ्या या आद्य मानवाचे मात्र पुरावे नेवासा इथून मिळाले नाहीत. वातावरणातील बदल आणि पाण्याची कमी-जास्त प्रमाणात असणारी उपलब्धता, नैसर्गिक संकटे यामुळे आद्य पुराश्मयुगीन काळानंतर ही जागा ओस पडली असावी. पण नंतर इथे मध्य पुराश्मयुगीन काळातील मानवाचे अस्तित्व आढळते.
पुढं शेती करणारा मानव, त्याच्यानंतर प्राचीन, पूर्व मध्ययुगीन ते मध्ययुगीन कालखंडातील मानवाच्या खुणा एकसलग आढळतात. नेवासासारख्या ठिकाणी एवढ्या मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्यानं महाराष्ट्राचा मानवी अस्तित्वाचा आद्य ते सद्यःस्थितीपर्यंतचा इतिहास एकसलगपणे समजून घेण्यास फार मदत होते.
आज हे स्थळ चिरकी नाला किंवा चिरकी नेवासा या नावानं पुरातत्त्वीय स्थळांच्या यादीत प्रसिद्ध आहे. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागात असणाऱ्या संग्रहालयात डॉ. ह. धी. सांकलिया सरांनी केलेल्या उत्खननाची व त्याच्या स्थरांची प्रतिकृती उभी केली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या आद्य मानवाच्या वस्तींपैकी नेवासा हे महत्त्वाचे स्थळ म्हणून आजही आपले महत्त्व टिकवून आहे.
जोर्वे संस्कृती
अंतर्गत दाखल केले
पूर्व-आधुनिक कला
प्रथम प्रकाशित
२९ ऑगस्ट २०२३
दुसऱ्या सहस्राब्दीच्या मध्यापासून ते इ.स. १००० पर्यंत चाल्कोलिथिक काळात , जोर्वे संस्कृती ही सध्याच्या महाराष्ट्रात केंद्रित असलेली एक सांस्कृतिक मालिका आहे. ही संस्कृती माळवा संस्कृतीशी जोडलेली होती आणि त्यानंतर आली आणि असे मानले जाते की माळवा संस्कृती समुदायांच्या दख्खन प्रदेशात स्थलांतरातून ती उद्भवली आहे, जिथे ते विद्यमान नवपाषाण कृषी समुदायांच्या संपर्कात आले, ज्यामुळे सांस्कृतिक संश्लेषण झाले. या संस्कृतीचे पुरावे प्रथम १९५०-५१ मध्ये महाराष्ट्रातील जोर्वे येथे उत्खननादरम्यान सापडले, ज्यावरून या संस्कृतीचे नाव पडले आहे.
मध्य महाराष्ट्रातील प्रवरा-गोदावरी खोरे हे जोर्वे संस्कृतीचे केंद्र मानले जाते. ही संस्कृती सध्याच्या महाराष्ट्राच्या बहुतेक भागात पसरली होती, किनारी कोकण प्रदेश वगळता, पूर्वेला विदर्भातील पूर्णा खोऱ्यापासून पश्चिमेला पुण्याजवळील थेऊरपर्यंत आणि उत्तरेला खानदेश प्रदेशापासून दक्षिणेला वरच्या कृष्णा खोऱ्यापर्यंत पसरलेली होती. संस्कृतीची सर्वात प्रमुख ठिकाणे म्हणजे दैमाबाद, नेवासा, बहल, प्रकाश, चांडोली, सोनगाव, थेऊर आणि इनामगाव, ज्यामध्ये प्रकाश, दैमाबाद आणि इनामगाव हे वस्ती क्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठे होते. प्रमुख ठिकाणे नदीच्या खोऱ्यात होती, ज्यात तापी खोऱ्याजवळ प्रकाश, गोदावरी खोऱ्यात दैमाबाद आणि भीमा खोऱ्यात इनामगाव होते.
ही संस्कृती त्याच्या विशिष्ट मातीकामासाठी ओळखली जाते, जी पूर्वीच्या मालवा संस्कृतीपेक्षा अधिक परिष्कृत दर्जाची होती. जोर्वे संस्कृतीची मातीकाम दोन प्रकारची होती - वैशिष्ट्यपूर्ण काळी-लाल मातीकाम आणि खरखरीत लाल किंवा राखाडी भांडी. पहिली मातीकाम जलद चाकावर फिरवलेल्या आणि चांगल्या प्रकारे बेक केलेल्या बारीक कापडाची होती. या मातीकामाच्या लाल/नारिंगी पृष्ठभागावर काळ्या रंगद्रव्यात भौमितिक नमुन्यांचा रंग होता. या शैलीमध्ये बनवलेल्या वस्तूंमध्ये कॅरिनेशनसह अवतल बाजू असलेला वाडगा, भडकणारे तोंड असलेल्या नळीच्या आकाराचा लोटा आणि उंच मानेचे भांडे यांचा समावेश होता. लाल किंवा राखाडी भांडी खरखरीत कापडाने बनवली जात असे आणि साठवणुकीच्या भांड्या, वाट्या, बेसिन आणि वातीसाठी कोनाड्या असलेले दिवे यासारख्या दैनंदिन वस्तूंसाठी वापरली जात असे. लाल किंवा राखाडी भांड्यांना कधीकधी काठावर लाल गेरूने प्रक्रिया केली जात असे, तर खरखरीत भांड्यांवर छेदन आणि अॅप्लिक नमुने होते. विद्वानांचे असे मत आहे की दोन्ही प्रकारच्या मातीकामांवर अनुक्रमे मालवा आणि दक्षिणेकडील नवपाषाण संस्कृतींचा वेगळा प्रभाव दिसून येतो.
जोर्वे संस्कृतीतील कुंभारकाम करणारे कारागीर एका विशेष भट्टीचा वापर करत असत, जी दगडी पायावर बांधलेली मातीची एक मोठी कुंड होती, ज्याचा व्यास १.७५ मीटर होता. अग्निकुंड भट्टीच्या पायथ्याशी होता आणि त्यावर वरून ६० मीटर खोलीवर मातीच्या गाद्या ठेवल्या होत्या. गरम वायूसाठी आउटलेट हवेच्या नळ्या आणि खोबणी तसेच मातीच्या गाद्यांवर छिद्रांच्या स्वरूपात प्रदान केले गेले होते.
जोर्वे संस्कृतीची घरे मालवा संस्कृतीच्या घरांचे अनुकरण करत होती, ज्यामध्ये आयताकृती आराखडे, भिंती आणि शंकूच्या आकाराचे बांधकाम होते. घरांमधील अंतर गल्ल्यांचे सीमांकन करण्यात काही प्रमाणात नियोजन असल्याचे सूचित करते. इनामगाव येथे, वस्तीचा पश्चिमेकडील भाग कारागिरांचे निवासस्थान म्हणून काम करत होता, उत्खननात कुंभारकाम, हस्तिदंती कोरीवकाम, तांबे आणि सोने आणि चुना बनविण्याचे काम करणारे तज्ञ असल्याचे पुरावे मिळाले आहेत. इमारतींच्या दुरुस्तीच्या पुराव्यावरून इनामगावच्या मध्यवर्ती भागातील घरे कदाचित श्रीमंत व्यक्तींची असतील. दैमाबादमध्ये मातीपासून बनवलेल्या बुरुजासह तटबंदीच्या भिंतीचेही अवशेष होते.
शेती, शिकार आणि मासेमारी हे उदरनिर्वाहाचे प्राथमिक स्रोत होते. बार्ली आणि गहू ही मुख्य पिके होती आणि पाळीव प्राण्यांमध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि डुक्कर यांचा समावेश होता. पाळीव आणि शिकार केलेले दोन्ही प्राणी खाल्ले जात होते आणि इनामगाव येथे आढळणाऱ्या मोठ्या अग्निकुंड्यांमध्ये शिजवले जात होते.
या संस्कृतीत प्रामुख्याने दगडी हत्यारे वापरली जात होती आणि त्यात विशेष ब्लेड आणि फ्लेक उद्योग होता, ज्यामध्ये चाल्सेडनी आणि अॅगेट सारख्या साहित्याचा वापर केला जात असे. तांबे आणि कांस्य यांचा वापर मर्यादित होता आणि त्यात कुऱ्हाडी, माशांच्या हुक, छिन्नी आणि चाकू यासारख्या अवजारांचा समावेश होता. इनामगावच्या जागेवरून चाल्सेडनीमधून तांबे काढण्यासाठी बांधलेल्या एका विशेष भट्टीचे पुरावे मिळाले, जे सध्याच्या इस्रायलमध्ये उत्खनन केलेल्या कांस्ययुगीन भट्टींशी शैलीत्मक साम्य दर्शवते. संस्कृतीच्या कलाकृतींमध्ये सूक्ष्म दगड, तांब्याच्या वस्तू, मणी आणि टेराकोटाच्या मूर्तींचा समावेश होता. टेराकोटाच्या कलाकृतींमध्ये घोड्याने ओढलेल्या रथाचे चित्रण करणारा एक सिलेंडर सील होता. वैयक्तिक दागिन्यांमध्ये कवच, हस्तिदंत आणि तांब्याच्या बांगड्या तसेच चाल्सेडनी, अॅगेट, जास्पर आणि कार्नेलियनपासून बनवलेले दागिने समाविष्ट होते.
विद्वानांच्या मते, सोनेकाम आणि हस्तिदंतीतील कारागिरांची उपस्थिती, तसेच दागिन्यांमध्ये शंखाचा वापर यावरून असे सूचित होते की जोर्वे संस्कृतीचा आसपासच्या प्रदेशांशी संपर्क होता. शंख कच्छ आणि कोकण किनाऱ्यांवरून आला असावा आणि हस्तिदंत आणि सोने सध्याच्या कर्नाटकातून आले असावे. इनामगाव आणि दैमाबाद ही मातीकामाची केंद्रे देखील असू शकतात, जी संस्कृतीच्या इतर ठिकाणी वस्तूंचा पुरवठा करत असत. मध्य प्रदेशातील नवदातोली आणि कर्नाटकातील टी नरसीपुरा येथे जोर्वे मातीकामाची उपस्थिती उत्तर आणि दक्षिणेकडील प्रदेशांशी सांस्कृतिक संबंध असल्याचे सूचित करते.
या ठिकाणाहून सापडलेल्या काही टेराकोटाच्या वस्तूंना धार्मिक किंवा धार्मिक महत्त्व असल्याचे मानले जाते. इनामगाव आणि नेवासा येथे भाजलेल्या आणि न भाजलेल्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती आढळल्या, ज्या महिलांच्या आकृत्या दर्शवितात असे मानले जाते. नेवासा येथे सापडलेल्या एका उल्लेखनीय आकृतीचा आकार देठासारखा होता, ज्याच्या वरच्या बाजूला डोके दर्शविणारा एक चिमटा होता, छाती दर्शविणारी चिमटा असलेली माती आणि हातांसाठी वक्र आकृत्या होत्या. या व्यतिरिक्त, त्या ठिकाणी बैल, डुक्कर, घोडा आणि घुबड यांच्या मूर्ती सापडल्या. इनामगाव येथे, एका घरात दोन आकृत्या सापडल्या, ज्यांचे स्तन हे एकमेव तपशीलवार शारीरिक वैशिष्ट्ये होती; त्यापैकी एक आकृती एका अंडाकृती पात्रात बसवली होती ज्यावर डोके नसलेली मादी मूर्ती आणि बैल ठेवण्यात आला होता. विद्वानांच्या मते, दोन्ही मादी मूर्ती देवीचे चित्रण मानल्या जाऊ शकतात. डोके नसलेल्या मूर्ती आणि बैलाच्या शरीरावर देखील कोनाडे होते जे एकत्र जोडल्यावर बैलावर बसलेली मूर्ती दर्शवितात.
त्यांनी मुलांसाठी कलश दफन करण्याची पद्धत अवलंबली. प्रौढांना लांब स्थितीत पुरले जात असे आणि त्यांचे पाय घोट्याच्या खाली कापले जात असत, कदाचित व्यक्तीचा आत्मा जिवंत जगात जाऊ नये म्हणून. दफन खड्ड्यांमधून रंगवलेल्या जोर्वे भांड्यांचे पुरावे देखील मिळाले ज्यामध्ये मृतांसाठी अन्न आणि पाणी ठेवले गेले असावे.
सुमारे १००० ईसापूर्व या संस्कृतीचा अचानक ऱ्हास सुरू झाला, जो फक्त इनामगाव येथेच सुरू राहिला, जिथे मातीकाम आणि वस्त्यांमध्ये दर्जा आणि घरांच्या आकारात घसरण झाल्याचे संकेत दिसू लागले. विद्वानांच्या मते, ही घसरण वाढत्या दुष्काळ किंवा दुष्काळासारख्या हवामान घटनेचा परिणाम असू शकते, ज्यामुळे लोकसंख्येचे स्थलांतर झाले असावे. याव्यतिरिक्त, काळ्या आणि लाल भांड्यांच्या उपस्थितीवरून विद्वान दक्षिण दख्खनशी सुमारे ८०० ईसापूर्व संपर्क साधण्याचा सल्ला देतात.
जोर्वे
श्री क्षेत्र जोर्वे दत्त जयंती उत्सव
जोर्वे संस्कृती एक पुरातत्वीय रहस्य
##############
वरून रांगडा कणखर काळा ओबडधोबड मातीचा;
अंतरात परी संत नांदती बोल सांगते मोलाचा.
माझा महाराष्ट्र हा इथे राहणाऱ्या लोकां सारखाच ,शरीराने बलदंड पण मनाने अत्यंत हळवा आहे .हे महाराष्ट्राचे रूप यादव ,चालुक्य ,सातवाहन ,राष्ट्रकूट ,कदंब ,सेंद्रक या राजसत्तांना इतके भावले, की त्यांनी ज्ञान, त्याग ,शौर्य ,ऐश्वर्य, कला-साहित्य यांचा एक एक दागिना हा महाराष्ट्राला घातला. या महाराष्ट्राच्या संपत्ती समोर देवेंद्र याचा दिमाख देखील फिका पडावा एवढीही संपन्नता .या महाराष्ट्राच्या संपत्तीत भर घातली यादव राजांनी म्हणतात, त्या काळातील महाराष्ट्र कसा होता तर ऐश्वर्यसंपन्न होता, इथं काशी सारख ज्ञान होतं ,द्वारके सारखं धन होतं ,राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता इथे घरांना कुलपे नव्हती, किल्ली हरवयाची चिंता नव्हती चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र युद्धात गाजत होता ,दह्या दुधात भिजत होता ,दान घ्यायला लाजत होता आणि पांडुरंगाला भजत होता.
बस इथून काय तो माझ्या महाराष्ट्राच्या इतिहासाला सुरुवात होते. आपल्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं की शिवाजी महाराज ,संभाजी महाराज ,पेशवे ते स्वातंत्र्यसमर एवढेच ती माहिती .काहीजण सातवाहन पर्यंतही जाऊन पोहोचतात .कारण महाराष्ट्राच्या लिखित वर्णनाला इथून सुरुवात होते ,पण याआधी देखील महाराष्ट्र हा होताच ना! त्याच वैभवशाली इतिहासाची पानं आज तुमच्यासमोर उलगडतो.
आपण इतिहासात शिकलो की भारताच्या वायव्येकडे सिंधू ही नागर संस्कृती सापडली .तशी एखादी संस्कृती महाराष्ट्रात सापडलीच नाही का? तर ती सापडली आणि तिचे नाव जोर्वे संस्कृती ..मी मुळचा संगमनेरचा आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय ,की महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात भर टाकायचे काम, महाराष्ट्रातील ताम्रपाषाण युगाची जगाला ओळख करून द्यायचे काम हे संगमनेर तालुक्यातील जोर्वे खेड्यापासून झाले. पुरातत्त्व खात्याच्या प्र घाता प्रमाणे ज्या ठिकाणी अवशेष सापडले त्या संस्कृतीला त्या गावाचे नाव देण्यात येते. उदाहरणार्थ =हडप्पा संस्कृती .तसेच या संस्कृतीचे अवशेष प्रथमतः जोर्वे येथे सापडले म्हणून या संस्कृतीला जोर्वे संस्कृती असे म्हणतात.
आदिमानव हा नदीजवळ वस्ती करत असेल .भटक्या अवस्थेत असल्याकारणाने दगडाची हत्यारे करीत असे. जुने झालेले हत्यार तो तेथेच टाकून स्थलांतर करी .नदीच्या गाळामुळे ती हत्यारे बुजवली गेली आणि कालपरत्वे नदीपात्र शुष्क झाल्यावर प्राचीन हत्यारे आणि वसाहती दिसू लागल्या .बहुतांश संस्कृतींचा शोध हा नदिकिनारी लागला. ज्याप्रमाणे धमन्या रक्त पुरविण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नद्या या महाराष्ट्राचे पोषण करतात. ऋग्वेदामध्ये सिंधू ,सरस्वती ,गंगा या नद्यांना देवता मानून त्यांचे स्तवन केले ले आपल्याला आढळते .या न्यायाने भीमा ,वरदा ,कृष्णा, कोयना ,प्रवरा ,गोदावरी, तापी या महाराष्ट्रातील सप्त गंगाच !!आणि जोर्वे संस्कृती नांदली यांच्याच खुशीत.
शोध=
1948 पर्यंत महाराष्ट्राचा इतिहास हा सातवाहन पर्यंतच मर्यादित होता. पण 1947 ला प्रवरा नदीला मोठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेती देखील पाण्याखाली गेली .या प्रकोपाला तोंड देण्यासाठी गावाने नदीच्या काठापासून आत चढावर वस्ती हलविली आणि शेती नदीकडे हलविली .आणि एक दिवस अचानक भाजक्या मातीची पात्रे ,मडकी त्यावर नक्षीकाम आणि कुऱ्हाडी ची पाती असा खजिना सापडला ..प्रत्येक गावाला मौखिक गोष्ट असते .त्याचप्रमाणे जोर्वे लाही आहे. म्हणतात ही महाभारतातील जरासंधाची नगरी होती. याला जेऊर ग्राम असे नाव होते .नंतर अपभ्रंशित होऊन ते जोर्वे झाले .लोकांना वाटले की हे पुराण काळातील भांडी असावीत .आणि लागोलाग बातमी पसरली आणि डॉ. एच .डी. सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली उत्खननास प्रारंभ झाला..
ताम्रपाषाण संस्कृती=
जोर्वे संस्कृती ही ताम्रपाषाण युगातील आहे. या युगात लोखंडाचा शोध लागलेला नव्हता फक्त दगड आणि तांब्याच्या आधारे अवजारे बनवली जात .जोर्वे चा शोध लागल्यानंतर अनेक ठिकाणी उत्खननात समकालीन गोष्टी सापडल्या .दायमाबाद, इनामगाव, नेवासा, चिंचोली ,प्रकाश(नंदूरबार) याठिकाणी उत्खननात साम्य दर्शक गोष्टी सा पडल्यात .ताम्रपाषाण युग हे इसवी सन पूर्व बाराशे लाच संपले ,पण जोर्वे संस्कृतीत ते इसवी सन पूर्व सातशे पर्यंत सापडते...
सुरुवात=
सिंधू संस्कृतीच्या उदयाने अत्यंत प्रगत अशी नागरी संस्कृती प्रकट झाली. सिंधू खोऱ्यात उगम होऊन की गंगा-यमुनेच्या सुपीक पट्ट्यात स्थिरावली .पण काही कारणाने याठिकाणी दुष्काळ जाणवला पाश्चात्य बाजूकडील व्यापार आणि दळणवळण बंद पडले. त्यामुळे हे लोक उदरनिर्वाहासाठी दक्षिणेकडे निघाले. राजस्थान आणि सौराष्ट्र यामार्गे ते दक्षिणेकडे निघाले .या भागात प्रगत पद्धतीची शेती करू लागले आणि शेती करीत असतानाच तापी खो-यातून ते दायमाबाद म्हणजेच महाराष्ट्रात आले. तापी खोऱ्यातील नंदुरबार जवळील प्रकाश येथे त्यांची एक वस्ती सापडते .हे लोक येताना त्यांची दैवते घेऊन आले. त्याच बरोबर सातू ,गहू, ज्वारी ,बाजरी ही धान्ये ही घेऊन आले. मूलतः ज्वारी बाजरी ही धान्य भारतीय नसून पर्शिया जवळील आहेत .पण सिंधू सभ्यतेच्या लोकांच्या पाश्चात्त्य देशांशी असलेल्या संबंधांमुळे ती महाराष्ट्रात आली. दायमाबाद हे ठिकाण तीन ते चार संस्कृतींचे माहेरघर बनले .यामध्ये सिंधू ,माळवा ,सावळग इत्यादी संस्कृतींचे अवशेष सापडले इसवी सन पूर्व सतराशे ते पंधराशे दरम्यान माळवा संस्कृती ही प्रगत झाली .आणि तिचा उल्लेख जोर्वे संस्कृती असा झाला...
वैशिष्ट्ये=
मातीची भांडी=
येथील भांडे म्हणजेच कुंभ ,वाडगे ,थाळ्या या भाजक्या मातीच्या बनवलेल्या असत. जास्त भाजल्यामुळे तांबडा रंग यांना येत असत. भांड्यावर फुले ,पाने आणि मासेमारी करतानाचे दृश्य सापडले आहेत .आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजेच तोटी असलेल्या भांड्यांचा हे लोक वापर करत होते.
अंतिम संस्कार=
हे लोक अगदी विलक्षण पद्धतीचा अंतिम संस्कार करत असत .लहान बाळाला माठामध्ये भरून ते पुरत होते .तर वयस्कर माणसाला रांजणा मध्ये भरून दक्षिण उत्तर गाडत असत .ते वेळेस डोके दक्षिणेला ठेवत .हे लोक पुनर्जन्मावर विश्वास ठेवत होते कारण पुरताना ते माणसाचे पाय घोट्यापासून कापून टाकायचे .कारण त्यांना अशीच शंका असायची की माणसाचे भूत होऊ नये .पुरताना प्रेतासोबत ते धान्यही गाडत असत. विशेष म्हणजे त्याकाळात स्मशानभूमी नव्हत्या तर हे लोक राहत्या घरातच प्रेताला गाडत होते. गावच्या मुख्य माणसाला रांजणा मध्ये बसवून गाडीत होते .त्यावेळेस त्याचे तोंड उत्तरेला ठेवत होते.
निवास व्यवस्था=
गावाच्या मुख्य माणसाचे घर हे आयताकृती होते. तर बाकीच्या लोकांची घरे ही गोलाकार होती. जमिनीत धान्य साठवण्यासाठी खड्डे केलेले असत आणि त्यावर चुन्याने लेपण असे. हे लोक गावाभोवती तटबंदी बांधत होते. दायमाबाद येथील उत्खननात तटबंदी सापडली .तर इनामगाव येथे तटबंदी आणि खंदक दोन्ही सापडले.
संस्कृतीचे उत्खनन अवशेष=
जोर्वे=
याठिकाणी ब्राँझ च्या सहा कुऱ्हाडी आणि एक तांब्याची बांगडी सापडली. कुऱ्हाडी ची लांबी 66 मि मी , तर रुंदी 56 मी मी इतकी होती. यातील तांब्याचे प्रमाण हे 97% तर बाकी कथील धातु होते.
इनामगाव=
याठिकाणी द्विस्तरीय घरांचे अवशेष ,कास्याच्या मूर्ती ,रंगीत खापरे इत्यादी गोष्टी सा पडल्यात.
दायमाबाद=
चार संस्कृतींचे माहेरघर असणाऱ्या दायमाबाद मध्ये कास्याच्या मूर्ती सापडल्या .त्यामध्ये कास्या चा रथ ,गेंडा, हत्ती चित्ता इत्यादी गोष्टी आहेत. त्याच बरोबर तत्कालीन एक विहीरही सापडली आहे.
सत्ता=
कोणत्याही राजसत्तेचा येथे पुरावा सापडत नाही. पण गावाचा मुख्य व्यक्ती हा सर्व कारभार बघत असेल असा अंदाज आहे. दायमाबाद येथे सापडलेल्या मातृ मूर्तीमुळे हे लोक देखील मातृ सत्ता मानणारे होते हे लक्षात येते...
शेती==
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटते की चार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी पिके घ्यायला सुरुवात झाली. विविध धान्य ,डाळी, कडधान्य ,तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव ,तांदूळ ,नाचणी, ज्वारी ,बाजरी ,राळ ,मसूर इत्यादी पिके ही माणसे घेत होती.
गव्हाला जास्त पाणी लागते म्हणून इनाम गावच्या लोकांनी पुराचे पाणी जमिनीला भेटण्यासाठी पाट काढले होते..
शेतीसाठीची अवजार हीदेखील उत्खननात मिळाली ..यात हरणाच्या शिंगापासून बनविलेले नांगर ,बैलाच्या हाडापासून बनविलेले नांगराचे काम करणारे पाते ,हरणाचे शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेले सीड ड्रील यांचा समावेश आहे ..अशाप्रकारे ही संस्कृती महाराष्ट्रात होती. विषय फार कठीण आणि सखोल आहे.. पण मी कमीत कमी शब्दात जोर्वे संस्कृती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. सध्या माझे काम यावरच चालू आहे म्हणून सहज स्थळदर्शन करण्यासाठी जोर्वे ला गेलो.तिथे एक प्राचीन दत्तमंदिर आहे .आणि अशी आख्यायिका आहे किती दत्तमूर्ती नदीत सापडली .आणि संशयाची पाल माझ्या मनाला चाटून गेली. सहज विचार आला की ही मूर्ती ताम्रपाषाण युगातील तर नसेल .तेथील पुजाऱ्यांना विनंती केली आणि मूर्तीचे निरीक्षण केले. जरा अभ्यास केला आणि आश्चर्य झालं .भारताच्या दत्तसंप्रदायातील प्रमुख असलेल्या दासोपंत संप्रदायातील ती मूर्ती आहे .आणि दासोपंतांचे शिष्य परमहंस संत ज्ञानेश्वर महाराज यांना ती सापडली .विशेष म्हणजे अशा प्रकारच्या फक्त दोनच मूर्ती या भारतात आहे .एक आंबेजोगाई जवळील माळवे येथे आणि दुसरी संगमनेरात. खरोखरच इतिहास कोठून कसा घेऊन जातो समजतच नाही
असा होता महाराष्ट्रातील ४ हजार वर्षांपूर्वीचा शेतकरी
By टिम बोलभिडू
6–7 minutes
असा होता महाराष्ट्रातील ४ हजार वर्षांपूर्वीचा शेतकरी
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे गुराखी मुलांना काही जुन्या मुर्त्या सापडल्या आहेत. श्रीरामपूरच्या पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञानी जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सिंधू संस्कृतीला समकालीन अवशेष आहेत.
On Mar 9, 2020 Last updated Mar 27, 2021
महाराष्ट्राच्या काळी मातीने शेतकऱ्यांना भरपूर दिलंय. अजूनही आपल्याकडे कृषिप्रधान संस्कृतीचा पगडा आहे. इडापीडा टळू दे बळीराजाचं राज्य येऊ दे असं कायम म्हटल जातं. छत्रपतींनी आपलं स्वराज्य उभारलं ते शेतकरी रयतेला सोबत घेऊनच. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी लिहिलेली आज्ञापत्रे मार्गदर्शक ठरतात.
आजही इथलं राजकारण देखील शेतकऱ्यांच्या सहकाराभोवती फिरत असते. एकूण काय महाराष्ट्र शेतकऱ्यांनी आपल्या घामाने उभा केलाय.
पण तुम्हाला ठाऊक आहे का महाराष्ट्रातल्या शेतीला साडे-चार हजार वर्षाचा इतिहास आहे.
अश्मयुगीन मानव गुहेत राहायचा. शिकार करणे आणि कंदमूळ खाणे अस त्याच जीवन असायचं. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अन्नपाण्याच्या शोधात भटकंती चालू असायची. कुऱ्हाडीसारख्या हत्याराचा वापर व्हायचा. काही काळाने त्याला जमिनीत पेरल की उगवत याचा शोध लागला. हा शोध क्रांतिकारी होता. त्यातूनच शेतीची कल्पना पुढे आली.
अस म्हणतात की, मानवाला शेतीचा शोध लागला आणि त्याच भटक आयुष्य स्थिर झाल. नदीच्या आसपास एकेठिकाणी वस्ती करून राहणे भाग पडले. जगभरात अशा नदीच्या शेजारच्या संस्कृती सापडल्या. यात सर्वात महत्वाची मानली जाते ती सिंधू संस्कृती.
हडप्पा मोहोन्जोदारो मध्ये आढळून आलेले अवशेष दाखवून देत होते की सिंधू संस्कृती एक प्रगती संस्कृती होती. ते शेती करायचे, गायी, बैले असे प्राणी पाळायचे, घाटाची भांडी स्वैपाकाला वापरायचे. इतकच काय त्यांनी शहरे वसवली होती. त्याच्या अभ्यासातून बरीच माहिती समोर येत होती. मात्र फाळणीनंतर हे सिंधू संस्कृतीचे अवशेष पाकिस्तानात राहिले.
भारतात इतरत्र या संस्कृतीची अवशेष शोधून काढण्याचे प्रयत्न सुरु झाले.
एकदिवस एका वर्तमानपत्रात बातमी आली की महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दायमाबाद येथे गुराखी मुलांना काही जुन्या मुर्त्या सापडल्या आहेत. श्रीरामपूरच्या पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञानी जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे सिंधू संस्कृतीला समकालीन अवशेष आहेत.
भारतीय पुरातत्वखात्यातर्फे डॉ. शंकरराव साली यांनी तिथे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. त्या मुर्त्या इ.स. पूर्व २२००-२००० म्हणजेच जवळपास साडेचार हजार वर्षापूर्वीच्या होत्या.
उत्तरेतील पर्यावरण प्रतिकूल होऊ लागल्या मुळे या काळात तिथल्या लोकांनी स्थलांतरे सुरु केली. सरस्वती नदी आटू लागली होती. पावसाचे प्रमाण कमी झाले होते. शेती करणे अशक्य होऊ लागले. हेच शेती करणारे लोक गुजरात महाराष्ट्र येथे नद्या काठी येऊन वसले.
गोदावरी नदीच्या खोऱ्यात प्रवरा नदी जवळ दायमाबाद येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका ओळीत आखणी केलेली कच्च्या विटांची घरे सापडली. यात धान्य साठवण्यासाठी वेगळी खोली, गुरांचा गोठा देखील आढळून आला. याचाच अर्थ हा शेतकरी पशुपालनाला देखील तितकेच महत्व देत होता,
हे हजारो वर्षापूर्वीचे शेतकरी त्याकाळच्या मानाने प्रगत होते.
शेतीसाठी ते लाकडी नांगर वापरायचे. नदीच्या पाण्याचा वापर ते सिंचनासाठी करत. त्याकाळात त्यांनी गहू, तांदूळ, बार्ली, मसूर,वाटाणे, तीळ या पिकाच उत्पादन घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत. या शेतकऱ्याच्या स्वैपाकघरात चुली होते. त्यांची भांडी मात्र भाजून बनवलेली होती. यात लहानमोठे घडे, रांजण,वाडगे देखील होते. त्यांना रंगवलेही जात होते. त्याकाळच्या कुभाराची भट्टीदेखील सापडली आहे.
पुढे या ताम्रपाषाण युगीन माळवा संस्कृतीमधून महाराष्ट्राच्या जोर्वे संस्कृतीचा उगम झाला. संपूर्ण राज्यभर या शेतकरी संस्कृतीचे अस्तित्व आढळून आले. ही सारी स्वयंपूर्ण खेडी होती.
पुण्याजवळच्या इनामगाव येथे देखील जोर्वे संस्कृतीचे अवशेष सापडले.
इनामगाव येथे घाटगे घराण्याची प्राचीन गढी आहे. तिच्याजवळ हाडे सापडत असल्यामुळे गावकरी या भागात कधी जात नसायचे. पण १९६८ साली तिथे केलेल्या संशोधनानंतर सापडलं की हे जोर्वे कालीन दफनभूमीचे अवशेष आहेत. तिथे एका टेकडीवर प्रागऐतिहासिक काळातील खेडदेखील सापडले. या घरांचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे अंगणात भाकरी भाजण्यासाठी भले मोठे चुलाने सापडले. धान्यसाठवण्यासाठी कणगीची सोय देखील आहे.
इनामगाव आणि दायमाबाद या दोन्ही ठिकाणच्या संशोधनावरून असे सिद्ध होते की तेथील शेतकरी रब्बी व खरीप या दोन्ही प्रकारचे पिक घेत होते.
इनामगावजवळ पाउस जास्त झाल्यावर घोडनदीला पूर येत असे. या पुराचे पाणी एका नाल्यावाटे वळवून साठवून ठेवायची दूरदृष्टी देखील हजारो वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी केली होती.
त्याकाळात दगडी हत्याराचा वापर जास्त केला जायचा. या सोबतच कुऱ्हाड, छन्नी अशी तांब्याची हत्यारे देखील आढळून आली.याच शिवाय त्याकाळच्या शेतकरी महिला थोड्या प्रमाणात का होईना सोन्याचे दागिने देखील वापरायची. कर्णफुले, सोन्याचा मणी आढळले आहे. तसेच इनामगाव येथे सोनाराच घर सापडलं आहे. त्यात मूस,तांब्याचे चिमटे होते.
या जोर्व्हे संस्कृतीच्या धार्मिक समजुतीबद्दलचा अभ्यास अजूनही चालू आहे. दायमाबाद आणि इनामगाव येथे शिरोहीन देवतेच्या मातीच्या मुर्त्या सापडतात. काही ठिकाणी मातीची चित्रे देखील सापडली. एक तर ती लहानमुलांची खेळणी असावीत अथवा गावजेवणापूर्वी एखादी पूजाविधी असावी.
दायमाबाद येथे खापरावरील रंग आढळते. येथे तांब्याचा गेंडा, रथ, हत्ती यांच्या जवळजवळ ६५ किलो वजनाच्या मूर्ती आढळल्या.
तिथे सापडलेल्या मुर्त्यामध्ये सर्वात महत्वाची मूर्ती आहे ती बैल जोडी च्या रथात बसलेल्या देवाची. सिंधू लिपी अद्याप वाचली गेली नसल्यामुळे हा देव कोण याच उत्तर मिळाल नाही पण तो शेतीशी संबंधित देव असावा.
सिंधू संस्कृती आणि जोर्वे संस्कृतीमधला फरक म्हणजे ही संस्कृती पूर्णपणे ग्रामीण होती.
जवळपास १००० वर्षे ही संस्कृती टिकली. इस.पूर्व १००० नंतर इथल हवामान देखील प्रचंड बदलले. या प्रतिकूल वातावरणामुळे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांना एकेठिकाणी वस्ती करून स्थिर जीवन जगणे अशक्य बनले. त्यामुळे हा महाराष्ट्राचा आद्य बळीराजा परत कंदमुळे आणि शिकारीच्या शोधात हा भाग सोडून बाहेर पडला. या वसाहती रिकाम्या झाल्या.
त्यांनतर मात्र या भागात तीन हजार वर्षे कोणीही वस्ती केली नाही यामुळे हे अवशेष जमिनी खाली शाबूत राहिले.
भारतातल्या इतर लाखो खेडेगावांसारखंच एक जोर्वे होतं. संगमनेरच्या पूर्वेला ६ मैलांवर, प्रवरेच्या काठी वसलेलं एक सर्वसाधारण खेडं. आपल्याकडे तशी अधूनमधून अस्मानी संकटं येत असतात, त्याचाच एक प्रकार म्हणून १९४७ साली प्रवरेला मोठ्ठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेतंसुद्धा पाण्याखाली गेली. परत अशा प्रकोपाला तोंड देणं सोयीचं व्हावं म्हणून गावाने नदीच्या काठापासून थोडी आत, चढावर वस्ती हलवली आणि आसपासची जमीन शेतीखाली आणायचं ठरवलं. आणि काय आश्चर्य! शेतीत नांगरताना अफुट, अखंड, मातीची भांडी सापडायला लागली. नेहेमीसारखी करडी, काळी, लालसर माठाची मडकी नव्हेत तर अगदी उत्तम भाजणीची, लाल रंगाची, वरती काळ्या रंगाने सुंदर नक्षीकाम केलेली तोटीची भांडी! आणि तांब्याची कुर्हाडीची पाती.
कुठल्याही गावाला जशी स्थानिक परंपरा, मौखिक गोष्टींतून चालत आलेला इतिहास असतो, तसा जोर्वेला सुद्धा होता. म्हणे कोणे एके काळी ही खुद्द जरासंधाची नगरी होती. त्यामुळे ही मडकी नक्कीच अशी पुराणकाळातली असली पाहिजेत असं आसपासच्या लोकांना वाटलं असणार!
ही सगळी बातमी कानोकानी होत होत पोचली ती संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेन्ट बोर्डमधे काम करणार्या शंकर साळी नामक तरुणाकडे. त्याने उत्साहाने या गावाला भेट देऊन ती खापरं पाहिली आणि त्यासंबंधी एक छोटीशी बातमी दैनिक भारत या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणली. आणि ही सगळी माहिती आणि खापरं घेऊन गाठलं या क्षेत्रातल्या एका जाणकाराला! डॉ. ह धी. सांकलिया यांना.
त्यावेळी पुण्याच्या डेक्कन कॉलेज या संस्थेत नुकताच पुरातत्त्वशास्त्राचा विभाग सुरू झाला होता. डॉ. ह. धी. सांकालिया या तरुण पुरातत्त्वशास्त्रज्ञाची तिथे नेमणूक करण्यात आली होती. मुंबईत संस्कृत शिकून, इंडॉलॉजीचा अभ्यास करून, नंतर इंग्लंडमधे खुद्द मॉर्टिमर व्हीलर नामक प्रख्यात पुरातत्त्वज्ञाच्या हाताखाली त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. इथे विद्यापीठ पातळीवर सरकारी चौकटीच्याबाहेर नव्याने पूर्ण विभागाची/ज्ञानशाखेची उभारणी करण्याचं काम मोठ्या तडफेने त्यांनी सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून नाशिक या पुरातनकालापासून अस्तित्वात असलेल्या नगरीचे उत्खनन करायचं ठरलं होतं. श्री. साळींनी आणलेली खापरं त्यांनी पाहिली आणि जोर्वेलाही छोटंसं उत्खनन करायचं असं ठरवलं.
१९५० साली उत्खनन केल्यावर ही खापरं एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं; पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने आणि तोपर्यंत शास्त्रीय कालमापन पद्धती अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं हा प्रश्नच होता! नाशिकच्या उत्खननाने मात्र हा प्रश्न समूळ सोडवला. तिथे सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या थरांमधे अशीच रंगीत, नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले. आत्तापर्यंत हे ही स्पष्ट झालं की या समाजाला लोखंड बनवायचं तंत्रज्ञान अजून अवगत झालं नव्हतं. माहित होतं फक्त तांबं आणि दगड - म्हणून यांना ताम्रपाषाणयुगीन वसाहती म्हणतात.
अशा तर्हेने महाराष्ट्रातील वसाहतींचा इतिहास एकदम २००० वर्षे मागे गेला आणि इतिहासपूर्वकालीन महाराष्ट्राच्या संशोधनाला जबरदस्त चालना मिळाली!
एकदा जोर्वेचा शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. यात तापी खोर्यातील प्रकाश, सावळदा, बहाळ, टेकवडे, कवठे, गोदावरी-प्रवरा खोर्यातील दायमाबाद, नेवासा, आपेगाव तसेच भीमा खोर्यातील शिरूरजवळ इनामगाव, बारामतीजवळचं सोनगाव, थेऊर इत्यादी स्थळांचा प्रामुख्याने समावेश होतो. या उत्खननांमुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालीन आदिम वसाहतींचा चेहरामोहरा कसा होता हे सांगता येतं.
Picture1.jpg
(जाता जाता थोडं विषयांतर:- या शोधाने एका व्यक्तीचं आयुष्यच पूर्ण बदलून टाकलं. संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेंट बोर्डमधे नोकरीला असलेल्या श्री. शंकर अण्णाजी साळी या तरुणाचं. स्वतःची नोकरी सोडून हा चक्क पुरातत्त्वशास्त्राच्या विद्याभ्यासामागे लागला. एवढंच नव्हे तर डेक्कन कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून ASI (Archaeological Survey of India) मधे चांगला हुद्दा पटकावला. आणि कालांतराने याच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्थळ दायमाबाद याचे यशस्वीरित्या उत्खननही केले!!)
तर महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात. अशीच एक - थोडीशी नंतरच्या काळातील - वसाहत सापडली जळगाव जिल्ह्यात पाटणे येथे. सुमारे २५ ते ३०,००० वर्षांपूर्वीच्या या हत्यारांबरोबरच रेघांनी सुशोभित केलेलं शहामृगाच्या अंड्याचं एक टरफलही सापडलं..
ही अशी लाखो वर्षं भटक्या अवस्थेत काढल्यानंतर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली. भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्याचा भाग (ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत.
आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. तिथेही ही वाटचाल अश्मयुगाकडून शेतीकडे अशी सलग झाली. त्यांच्याकडूनच उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख नर्मदेच्या दक्षिणेला रहाणार्या मानवसमूहाला झाली असं दिसतं. या सर्व प्रसारामधे मात्र एका लोकसमूहाने विविध ठिकाणी पांगून जाऊन, नव्या वसाहती करून शेतीची ओळख त्या त्या प्रदेशाला करून दिली असं काही दिसत नाही. त्या त्या प्रदेशातील स्थानिक लोकांनी शेजारच्या शेती करणार्या समाजांकडून हे नवं तंत्र आत्मसात करून घेतलं.
असो. परत येऊया महाराष्ट्रातील आदिम वसाहतींकडे..
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे.
या वसाहतींचा आढावा घेताना आपण एकत्रच या सगळ्या कालावधीचा विचार करणार आहोत. अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.
धुळे जिल्ह्यातली कवठे इथली वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स. पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/ साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.
कवठे येथील घर
kaothe.jpg
अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले.
आजवर अशी १५०हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्यापैकी मोठी होती. दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३०हेक्टर मोठं होतं आणि त्याला तटबंदी होती तर इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३हे. च्या मधे होतं. यांमधे स्थायी स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या सान्निध्यात वसलेल्या होत्या.
गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला जात असावा. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान, धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत (मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने, शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि साठवणीची जागा असंही बर्याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं ४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत. सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत. घरांमधे हमखास आढळणार्या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे
inm.jpg
यात सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी. आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४ दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं.
चूल म्हणजे काही वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा, त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्याही इंधन म्हणून यात स्वाहा होत.
एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या (तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू, गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी, लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात.
(या लेखाच्या प्रारंभालाच इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अॅन्टेलोप काढलेलंही स्पष्ट दिसत आहे)
mlw ware.jpgbowls.jpglamps_0.jpg
रोजची औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्हाडी, गारगोटीचे छिलके काढून तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार व्हायची!), तांब्याच्या कुर्हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय!
लोक कपडेबिपडे घालत होते की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या 'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात. भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी अॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक, लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी उत्खननांमधून मिळालेत.
उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी, शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging) असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत.
आपल्याला पुरावा पाहून आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं, तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती.
शेतीसाठी वापरात आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill (याला मराठीत काय म्हणतात बरं?) यांचा समावेश आहे.
antler hoe.jpgseed drill.jpg
पाळीव प्राण्यांमधे गाय-बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, गाढवं, कोंबड्या, डुकरं, आणि कुत्री, मांजरं यांचा पुरावा आढळतो. घोडा आढळतो पण तो अगदी शेवटच्या कालखंडात (बहुदा दक्षिण भारतातल्या लोहयुगीन लोकांच्या संपर्कामुळे).
शिकार करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं, रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर, कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक, खेकडे, मासे, इ.
या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच. याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे, शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो.
या सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच बनवत.
हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती.
इनामगावच्या उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे ६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं!
kiln.jpg
आणि इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर शुद्ध रस खापराच्या मुशीत!
एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते.
या परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:-
तांबे (राजस्थान/गुजरात); शंख (गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अॅमेझोनईट हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ.
दळणवळणाची साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर! शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात.
रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र
cart.jpg
हे झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून (इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही).
हे लोक मृतांचे दफन करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult) व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात. शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत.
burial.jpg
बाकी त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही. पण विविध प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात. तेव्हा स्त्रीतत्त्वाची/ सुफलनाची संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल नाही. शिवाय गुजरात, राजस्थान, माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात. बैल कदाचित पुरुषतत्त्वाशी, शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा. इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली. ही निश्चितच कुठल्यातरी धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून गेला आहे. याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग एका वन्य प्राण्याचा (बहुदा बिबळ्या) अशीही एक आकृती आढळते. याचाही संबंध त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.
अग्निपूजेचाही एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे दाणे सापडले आहेत.
हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते. म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे chiefdom असं म्हणतात).
chief.jpg
हे असे समाज भारतात इतर प्रदेशातही होते. हळूहळू यांना लोहतंत्रज्ञानाचा शोध लागला आणि इ.स. पूर्व ५-६व्या शतकानंतर येणार्या शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली दिसते. अगदी विदर्भातही असाच सांस्कृतिक कालानुक्रम आढळतो. पण दख्खनच्या पठारावर मात्र काही वेगळंच घडलं!
इ.स.पूर्व १२०० -१००० च्या दरम्यान तापी, गोदावरी-प्रवरा खोर्यातल्या वसाहती उजाड झाल्या. पुढे अगदी इ.स.पूर्व ३-४थ्या शतकांपर्यंत या भूप्रदेशात मनुष्यवस्तीचा पुरावा संशोधकांना मिळालेला नाही. हे काय गौडबंगाल आहे? याचं उत्तर थोड्याफार प्रमाणात दिलं इनामगावच्या उत्खननाने. तापी, गोदावरी खोर्यांमधे न आढळणारी पण फक्त भीमेच्या खोर्यातच आढळणारा ताम्रपाषाणयुगाचा शेवटचा कालखंड इथे तपशीलवार अभ्यासला गेला.
अभ्यासकांच्या मते राजस्थानातील पुरापर्यावरणाच्या अभ्यासावरून असं दिसतं इ.स.पूर्व १२००-१००० च्या सुमारास पश्चिम भारतातील हवामान आणखी शुष्क व्हायला सुरुवात झाली. पर्जन्यमान घटलं आणि पाऊस आणखी बेभरवशाचा झाला. वारंवार दुष्काळही पडू लागले असावेत. या सगळ्याचा परिणाम मानवसमूहांवर झाला नसता तरच नवल!
इनामगावचा पुरावा असं दाखवतो की अचानक याच सुमारास लोकांच्या राहणीमानात बदल झाले. चौकोनी घरं सोडून आता हे लोक गोल झोपड्या बांधून राहू लागले. दफनंसुद्धा थोडी घाईगडबडीत उरकली जाऊ लागली. शेतीतही मोठे बदल झाले. गव्हाचं पीक आता कोणी घेइनासं झालं. जव, नाचणी यासारख्या तुलनेने कमी पाण्यात, पटकन होणार्या आणि फारसा खटाटोप न करता साठवता येतील अशा पिकांचं प्रमाण खूप वाढलं. जास्त पाणी, चारा लागणार्या गाईगुरांची खिल्लारं कमी होऊन शेळ्यामेंढ्यांचं प्रमाण वाढलं. आहारात गोमांस कमी होऊन काळविटाचं मांस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक ठरला. खापरांवरची नक्षी खूपच कमी झाली आणि त्यांचा पोत खरखरीत झाला. भाजणीही आता तितकीशी उत्तम राहिली नाही. एकूणच रोजच्या जीवनातला तणाव वाढलेला दिसतो. खायचीप्यायची भ्रांतही अधूनमधून पडत असावी कारण एका कुत्र्याचाही समावेश आहारात केल्याचा पुरावा इनामगावात मिळाला आहे.
या सगळ्या पुराव्याचं विश्लेषण करून अभ्यासकांनी असं दाखवून दिलं की इतकी शतकं एक स्थिरस्थावर जीवन जगणारे हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी या अस्मानी संकटांशी झगडता झगडता टेकीला आले आणि नाईलाजाने आपल्या उपजीविकेचे मार्ग त्यांनी बदलले.
आजही जिथे अतीव दुष्काळात महाराष्ट्रातील शेतकरी घरदार, खिल्लार सोडून केवळ जगण्यासाठी वाट फुटेल तिथे जातो, वेळप्रसंगी शहरात भीकसुद्धा मागतो, तिथे अशा 'जास्तीच्या' लोकांना सामावून घेणारी शहरीकरणाची आर्थिक यंत्रणा नसताना या शेतकर्यांनी तरी काय करावं? मग संस्कृतीचं चक्र 'उलटं' फिरलं! परत एकदा स्थिर शेतीकडून हे लोक अर्ध-भटक्या (semi-nomadic) पशुपालन आणि शिकारीच्या जीवनाकडे वळले.
इनामगावसारख्या गावात कायमचे स्थायिक असलेले लोक जगायला बाहेर पडले आणि मग अधूनमधून काही काळच मुक्कामासाठी परतू लागले. हळूहळू हेही कमी झालं. मग इ.स. पूर्व ८व्या शतकात कधीतरी एकदा गावातून निघालेली कुटुंबं, त्यांच्या पुढच्या पिढ्या कधीच परतून आल्या नाहीत. पोटापाण्यासाठी भटकत कुठे दूर देशी गेले कुणास ठाऊक! त्यांची घरं मात्र तशीच त्यांची वाट पहात राहिली. कायमची.
इनामगावची आणि दख्खनच्या पठारावरच्या आदिम वसाहतींची गोष्ट पुरातत्त्वासाठी इथेच थांबते. पुढे आणखी ४००-५०० वर्षे कुठल्याही वसाहतींचा पुरावा आपल्याला अजून मिळत नाही. मग एकदम सातवाहन कालाच्या थोडं आधीपासून परत एकदा सगळीकडे गावं वसलेली दिसतात. प्रकाश, नेवासा अशा ताम्रपाषाणयुगीन वसाहतीही परत एकदा माणसांच्या वास्तव्याने नव्याने फुलून उठतात. (इनामगाव, दायमाबाद, सोनगाव मात्र परत कधीही कुठल्याही कालखंडात 'जिवंत' झाली नाहीत). सातवाहनांच राजकुल उदयाला येतं आणि दख्खनच्या पठाराचा लिखित इतिहासकाल सुरू होतो.
या ताम्रपाषाणयुगीन लोकसमूहाचे वंशज निश्चितच याही इतिहासकालाचा अविभाज्य भागच असणार. पण आजतरी आपल्यासाठी त्यांची ही ओळख ही एक गुपितच आहे.
कुणी सांगावं? माझ्या आणि माझ्यासारख्याच आणखी काही वेड्या संशोधकांच्या हाताला कधीकाळी तरी यश येईल, आणि मधले दुवे जुळवणारे पुरावे सापडतील. इनामगावची गोष्ट पूर्ण तर केली पहिजे ना.... या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी!!
ताजा कलमः मायबोलीवरच लिहिलेल्या अन्य एका लेखातली माहिती इथे अपडेट करून पुरवणी जोडते आहे - भीमेच्या खोर्यातून या अंतकाळाचे फारसे पुरावे हाताला लागले नसले तरी कृष्णेच्या खोर्यातील सुपीक, बारमाही पाणी आणि उत्तम पावसाच्या प्रदेशातून (वारणा-मोरणेच्या संगमाजवळ) उत्तर जोर्वेकालीन वसाहती उजेडात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळ --> भटके जीवन हे गृहितक सगळ्याच वसाहतींना सरसकट लागू पडते का हा कळीचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे. एकुणातच या अंतकालाचा नव्याने पुरावे शोधून साकल्याने फेरविचार करायची गरज आहे हे माझे मत मला परत एकदा 'पुराव्याने शाबित' करून अधोरेखित करता आले आहे.
जोर्वे-नेवासे संस्कृती (Jorve-Newase Civilization) | थिंक महाराष्ट्र
See author's posts
10–12 minutes
हाताशी एक आठवडा होता. अचानक अहमदनगरला जायचे ठरवले. दोन दिवस अहमदनगरमध्ये काढायचे आणि नंतर आजूबाजूला फिरायचे असा बेत होता. नगरमध्ये फिरून झाले मग विचार केला की या फेरीत जोर्वे, नेवासे अशी दोन गावेही पाहून घ्यावी. नकाशावर पाहिले, अंतरही फार नव्हते. अनेक वर्षांपासून ती गावे पाहायचे राहून गेले होते. अगदी राहूरीपर्यंत येऊनही नेवाशाला जाणे झाले नाही. नेवाशाला जाऊन पैसाच्या खांबापाशी थोडा वेळ बसायचे होते. यज्ञाच्या राखेत लोळल्यावर, धर्मराजाच्या मुंगुसाच्या अंगाला जसे चारदोन सोन्याचे कण चिकटले होते, तसे पैसाच्या खांबापाशी सापडलेच चारदोन बावनकशी शब्द तर गोळा करायचे होते.
बरोबर चार मैत्रिणी होत्या. नगरमध्ये फिरून झाल्यावर, नेवाशाला जाऊन मुक्काम करायचे ठरले. लगेच निर्णयाची अंमलबजावणी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कवी आणि तत्त्वज्ञ असलेल्या महाराष्ट्राच्या माऊलीला वंदन केले. चार घटका तिथे टेकलो. आजूबाजूच्या लोकांशी बोलण्यात वेळ गेला. नेवासे गाव म्हटले तर इतर चार गावांसारखे आहे. पण पैठणला जसा एकनाथांच्या अस्तित्वाचा गंध आहे तसा नेवाशाला ज्ञानेश्वरांच्या अस्तित्वाचा आभास आहे. तसा तो आळंदीतही आहे. ज्ञानदेवांनी इथे ज्ञानेश्वरी लिहिली हे नेवासे गावाचे महत्त्व आहेच पण त्याच बरोबर या गावात ताम्रपाषाण युगातल्या मानवाच्या वसाहतींचा पुरावा सापडला आहे, ही बाब आमच्यासाठी आकर्षणबिंदू होती.
महाराष्ट्रातल्या आद्य मानवी वसाहतींची संस्कृती ‘जोर्वे-नेवासे’ संस्कृती म्हणून ओळखली जाते. ही दोन्ही गावे प्रवरा नदीच्या काठी आहेत. नेवाशाला जिथे उत्खनन झाले आहे ती जागा परतीच्या प्रवासात पाहावी असा विचार करून नकाशावर आधी जोर्वे गावाचा रस्ता शोधायला सुरुवात केली. तेवढ्यात जोर्वेच्या आधी दायमाबाद अशी पाटी दिसली. दायमाबाद हा देखील त्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा पाडाव. मग आणखी पुढचे काहीच दिसेना. गाडी सरळ दायमाबादच्या दिशेने वळवली. दायमाबाद संगमनेरपासून आठ किलोमीटर अंतरावर, प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. तिथेही ताम्रपाषाण युगातली मातीची भांडी आणि गारगोटीच्या पातळ तुकड्यांची हत्यारे सापडली आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचा पुरातन कालाचा पुरावा पहिल्यांदा जोर्वे येथे सापडला. नंतर नेवासे येथे झालेल्या उत्खननात ह्या संस्कृतीवर अधिक प्रकाश पडला म्हणून या संस्कृतीचे नाव ‘जोर्वे-नेवासे’ संस्कृती ! ह्या संस्कृतीचा काळ साधारण ख्रिस्तपूर्व बाराशे ते पंधराशे वर्षे असावा. इथे सापडलेली भांडी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ही मातीची भांडी तुलनात्मकदृष्ट्या पातळ आहेत. भट्टीमध्ये उत्तम प्रकारे भाजलेली असल्यामुळे त्यांचा धातूच्या भांड्यांप्रमाणे टणटण् आवाज येतो. विटकरी रंगाच्या त्या भांड्यांवर इतर पुरातत्त्वीय ठिकाणी आढळणाऱ्या भांड्यांप्रमाणे प्राण्यांची चित्रे काढलेली आहेत. क्वचित एखाद्या भांड्यावर स्वस्तिकाचे चिन्ह काढलेले आहे. असे स्वस्तिकाचे चिन्ह हे महाराष्ट्रात इतरत्र किंवा दक्षिण भारतात सापडण्याआधी येथेच प्रथम आढळून आले आहे.
दायमाबादला गावात शिरताना एका टपरीवर पुरातत्त्वीय उत्खनन झालेली जागा कुठे आहे याची चौकशी केली. त्यातल्या एकाने गावाबाहेरच्या रस्त्याच्या दिशेने हात उडवला आणि पुस्ती जोडली, ‘आता तिथे काहीच नाही, मॅडम.’ उत्खननाची जागा सापडायला काही अडचण आली नाही. पुरातत्त्व खात्याचा नेहमीप्रमाणे गंजका, निळा बोर्ड दिसला. जागेला कुंपण आणि उघडे फाटक होते. गाडी सहज आत गेली. पहारेकरी, गाईड वगैरे कोणी आजूबाजूला नव्हते. गाडी आत जातच राहिली. पण मग थोडे पुढे गेलो की नाही, तेवढ्यात एक तरूण माणूस मोटरसायकलवर मागोमाग आला आणि आम्ही कोण, कशाला आलो वगैरे चौकश्या करायला लागला. ज्या टपरीवरून आम्ही पुढे आलो होतो तिथून त्याला खबर गेली होती. पांढरी इनोव्हा गाडी असल्यामुळे सरकारी पाहुणे असावेत अशा समजुतीने तो घाईघाईने आला होता. आम्ही साधे टुरिस्ट आहोत आणि केवळ कुतूहलापोटी उत्खननाची जागा बघायला आलो आहोत असे म्हटल्यावर तो निवांत झाला आणि स्वत:हून आमच्या बरोबर फिरायला लागला. हा दायमाबादच्या उत्खननात सहभागी असलेल्या लाल हुसेन पटेल यांचा मुलगा होता. दायमाबादला 1958-59 पासून 1978-79 पर्यंत चार वेळा उत्खनन झाले आहे. आता ही ‘साईट’ (स्थळ) बंद करण्यात आली आहे.
संस्कृतीविषयी इंग्लिशमधून बोलताना दोन वेगवेगळे शब्द वापरले जातात – कल्चर आणि सिव्हिलायझेशन. सिव्हिलायझेशन हा सिव्हिल म्हणजे नागर होण्याच्या दिशेने झालेला प्रवास, प्रक्रिया आहे तर कल्चर हा त्या प्रक्रियेचा आविष्कार आहे. मराठीमध्ये सरसकट संस्कृती हा एकच शब्द वापरला जातो. पण ‘सिंधु संस्कृती’ आणि ‘मराठी संस्कृती’मधल्या ‘संस्कृती’ या शब्दांच्या अर्थामधला फरक संदर्भाने माहीत असतो. नागरीकरण याचाच अर्थ रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत होण्याची प्रकिया. जीवनाच्या विविध अंगांवर होणारे संस्कार. सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि त्याबरोबर तंत्रज्ञानामध्ये होणारे बदलही.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर या नागरीकरणाच्या प्रवासाच्या दिशेने सुरुवात सुमारे दोन ते तीन लाख वर्षांपूर्वी झाली. इथल्या अतिप्राचीन मानवी वसाहतीचे तीन कालखंड पडतात. अश्मयुग, ताम्रपाषाणयुग आणि लोहयुग. इथल्या माणसांनी, त्यांना मराठी म्हणता येणार नाही कारण मराठी ही आपली ओळख जेमतेम बाराशे-तेराशे वर्षे जुनी आहे. आद्य अश्मयुगात म्हणजे साधारण दोन लाख वर्षांपूर्वी तयार केलेल्या दगडी हत्यारांचे अवशेष गोदावरी, प्रवरा, मुळा-मुठा, तापी, पूर्णा, वर्धा इत्यादी अनेक नद्यांच्या काठी सापडले आहेत.
ताम्रपाषाण युगात शेतीची माहिती असलेल्या, तांब्याची आणि दगडी हत्यारे वापरणाऱ्या टोळ्या इथे स्थायिक झाल्या होत्या. ती माणसे गवताने शाकारलेल्या कुडाच्या झोपडीत राहात होती. शिकार, शेती, पशुपालन, मासेमारी ही त्यांच्या उपजिविकेची साधने. हे आद्य शेतकरी. गहू, तांदुळ, ज्वारी, डाळ अशी धान्ये पिकवत असत. जनावरांचे मांस खारवून वाळवून ठेवत असत आणि अंगणात एक खड्डा करून त्यात मांस भाजत असत. धान्य कुटले जात असे आणि त्यासाठी दगडी खल वापरत असत. धान्य दळण्याचे जाते आपल्याकडे इजिप्तमधून उशीरा आले. या इजिप्शीयन जात्याची वरची तळी उभट असून जड असते. दोन्ही तळी सारख्या असणारे जाते हे इजिप्शीयन जात्याचे विकसित रूप आहे. ‘जोर्वे-नेवासे’ संस्कृतीमध्ये मृतांना रांजणात घालून पुरण्याची पद्धत होती. दफन करताना मोठमोठ्या दगडी शिळांचा आणि फरश्यांचा वापर करत असत. मृतांचे स्मारक म्हणूनही शिळावर्तुळे उभारत. महाराष्ट्रभर अनेक ठिकाणीही अशी शिळावर्तुळे आढळून येतात. मृतांच्या शेजारी त्यांच्या परिस्थितीप्रमाणे भांडीकुंडी ठेवत असत. नेवाशाला एक तांब्याच्या मण्यांची माळ रेशमाच्या आणि सुताच्या धाग्यात गुंफलेली सापडली. अशा प्रकारे रेशीम आणि सूत यांचे संमिश्र सूत भारतात प्रथमच सापडले. आद्य शेतकऱ्यांच्या भरभराटीला आलेल्या या वसाहती वातावरणातल्या बदलामुळे इसवी सनपूर्व पाचशेच्या आसपास नष्ट झाल्या असाव्यात.
दायमाबादची वसाहत हे उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीचे स्थळ आहे. तेथे टेराकोटाचे तीन शिक्के (सील) सापडले आहेत, ज्यांच्यावर सिंधू संस्कृतीच्या लिपीतले चिन्ह आहे. मातीच्या भांड्यांच्या काही तुकड्यांवरही सिंधू लिपीतली चिन्हे सापडली आहेत. दायमाबादच्या परिसरात हिंडत असताना हा सर्व इतिहास पाठीशी होता. पटेल यांचा मुलगा घरांची जोती, चपट्या विटांची विहीर, नदीच्या बाजूच्या बांधाचे अवशेष अशा सगळ्या जागा उत्साहाने दाखवत होता. त्याच्या माहितीनुसार इथे सापडलेले अवशेष अनेक ट्रक्समधे भरून पुण्याला नेले. पुण्याला ते नेमके कोणाच्या ताब्यात आहेत याविषयी त्याला माहिती नव्हती. आता ही साईट बंद करण्यात आली आहे तरी खापराचे तुकडे सगळीकडे पसरलेले होते. साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या विहिरीत डोकावून पाहताना एक सूक्ष्म थरार जाणवला खरा !
दायमाबादच्या बाबतीत एक नाट्यमय घटना घडली होती. 1974 मध्ये छबू लक्ष्मण भील नावाच्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातले एक झुडूप मुळासकट काढताना, त्याच्या मुळाशी चार ब्रॉन्झच्या मूर्ती सापडल्या. त्या घेऊन तो गावातले सुशिक्षित आणि सामाजिक कार्यात भाग घेणाऱ्या लाल हुसेन पटेल यांच्याकडे गेला. त्यांनी त्या वस्तू भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागापर्यंत पोचवल्या. त्यात एक रथ किंवा बैलगाडी म्हणता येईल असे शिल्प होते. दोन बैल जोडलेल्या या गाड्यावर एक माणूस उभा आहे आणि गंमत म्हणजे गाडी आणि बैल यांच्या मधल्या दांड्यावर एक कुत्रा आहे. याखेरीज हत्ती, म्हैस आणि गेंडा यांचेही गाडे आहेत. त्यातले रथाचे शिल्प सध्या राष्ट्रीय संग्रहालय, नवी दिल्ली येथे आहे तर बाकी शिल्पे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात आहेत.
दायमाबादच्या परिसरात हिंडून झाल्यावर आम्ही पटेल यांच्या घरी गेलो. एम. एन. देशपांडे, एस. आर. राव आणि एस. ए. साळी या तिन्ही पुरातत्त्व शास्त्रज्ञांबरोबर त्यांनी दायमाबादच्या उत्खननात भाग घेतला होता. भारतीय पुरातत्त्व विभागाला सादर करण्यात आलेल्या संपूर्ण अहवालाची प्रत त्यांच्यापाशी होती. ती अपूर्वाईने पाहिली. चहापाणी झाले, घरातल्या लोकांशी गप्पा झाल्या आणि मग तिथून निघालो.
दायमाबादच्या अनुभवाने मग अतिशय उत्साहाने जोर्वे गावात पोहोचलो. तिथेही गावाबाहेर विचारल्यावर पहिली प्रतिक्रिया ‘आता इथे काही नाही’ अशीच होती. तसेच रेटून गावात गेलो. भोवती माणसे जमली, त्यांना विचारले, ‘उत्खननाची साईट कुठे आहे?’ उत्तर आलं. ‘तुम्ही उभ्या आहात तिथेच.’ काहीशा आश्चर्याने आणि काहीशा दु:खी मनाने पायाखाली पाहिले, आजुबाजुला नजर टाकली. तर भराव टाकून लोकांनी छान घरं बांधलेली होती. साईट बंद झाल्यावर तिथे सगळीकडे एकमजली, दुमजली घरांची दाटी झालेली होती. सर्व अवशेष काढून इतरत्र नेल्यावर रिकामे खड्डे ठेवून काय करायचे हा विचार कदाचित योग्यच असेल तरी काहीतरी हरवल्यासारखे वाटले. महाराष्ट्रातल्या ‘पहिल्या मानवी वसाहतींपैकी एक’ असलेल्या जागी, त्या वसाहतीचे अवशेष नाहीत. किंवा कदाचित असेही असेल की वसाहतीच्या जागी आणखी एक वसाहत उभी राहिली. कालचक्र चालू राहिले. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती!’
गंमत अशी आहे की महाराष्ट्राचा इतिहास म्हटला की इथल्या माणसांची दृष्टी चारएकशे वर्षांपलीकडे जात नाही. अर्थात ह्या चारशे वर्षांच्या इतिहासाच्या खाणाखुणाही फार प्रेमाने जपल्या जातात असे नाही. इतिहासामध्ये रस असणा-यांसुद्धा जोर्वे, नेवासे, प्रकाशे, सोनगाव, इनामगाव ही नावे अभावानेच माहीत असतात. अनेक ठिकाणी मृतांचे स्मारक म्हणून उभारलेली शिळावर्तुळे आहेत, सतींच्या शिळा आहेत, वीरगळ आहेत पण गावात रहाणा-या लोकांना त्यांचा संदर्भ माहीत नसतो. अज्ञानच नाही तर अनास्थाही असते. कोणीतरी बालबुद्धीने या शिळांना शेंदूर फासतो आणि मग पुढे पिढ्यानपिढ्या त्यांच्यावर शेंदराचे थर चढत जातात. दगडावर चढलेले असोत की बुद्धीवर; हे चिकट थर खरवडणे तसे अवघडच.
संदर्भ: महाराष्ट्रातील पुरातत्त्व- हसमुख धी. सांकलिया, मधुकर श्री. माटे
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई. (1976)
Submitted by वरदा on 24 September, 2009 - 04:31
jorwe pot.jpg
(छायाचित्र प्रताधिकारः श्री पद्माकर प्रभुणे)
भारतातल्या
इतर लाखो खेडेगावांसारखंच एक जोर्वे होतं. संगमनेरच्या पूर्वेला ६
मैलांवर, प्रवरेच्या काठी वसलेलं एक सर्वसाधारण खेडं. आपल्याकडे तशी
अधूनमधून अस्मानी संकटं येत असतात, त्याचाच एक प्रकार म्हणून १९४७ साली
प्रवरेला मोठ्ठा पूर आला. या पुरात गावच नव्हे तर शेतंसुद्धा पाण्याखाली
गेली. परत अशा प्रकोपाला तोंड देणं सोयीचं व्हावं म्हणून गावाने नदीच्या
काठापासून थोडी आत, चढावर वस्ती हलवली आणि आसपासची जमीन शेतीखाली आणायचं
ठरवलं. आणि काय आश्चर्य! शेतीत नांगरताना अफुट, अखंड, मातीची भांडी
सापडायला लागली. नेहेमीसारखी करडी, काळी, लालसर माठाची मडकी नव्हेत तर अगदी
उत्तम भाजणीची, लाल रंगाची, वरती काळ्या रंगाने सुंदर नक्षीकाम केलेली
तोटीची भांडी! आणि तांब्याची कुर्हाडीची पाती.
कुठल्याही गावाला
जशी स्थानिक परंपरा, मौखिक गोष्टींतून चालत आलेला इतिहास असतो, तसा
जोर्वेला सुद्धा होता. म्हणे कोणे एके काळी ही खुद्द जरासंधाची नगरी होती.
त्यामुळे ही मडकी नक्कीच अशी पुराणकाळातली असली पाहिजेत असं आसपासच्या
लोकांना वाटलं असणार!
ही सगळी बातमी कानोकानी होत होत पोचली ती
संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेन्ट बोर्डमधे काम करणार्या शंकर साळी नामक
तरुणाकडे. त्याने उत्साहाने या गावाला भेट देऊन ती खापरं पाहिली आणि
त्यासंबंधी एक छोटीशी बातमी दैनिक भारत या स्थानिक वृत्तपत्रात छापून आणली.
आणि ही सगळी माहिती आणि खापरं घेऊन गाठलं या क्षेत्रातल्या एका जाणकाराला!
डॉ. ह धी. सांकलिया यांना.
त्यावेळी पुण्याच्या डेक्कन कॉलेज या
संस्थेत नुकताच पुरातत्त्वशास्त्राचा विभाग सुरू झाला होता. डॉ. ह. धी.
सांकालिया या तरुण पुरातत्त्वशास्त्रज्ञाची तिथे नेमणूक करण्यात आली होती.
मुंबईत संस्कृत शिकून, इंडॉलॉजीचा अभ्यास करून, नंतर इंग्लंडमधे खुद्द
मॉर्टिमर व्हीलर नामक प्रख्यात पुरातत्त्वज्ञाच्या हाताखाली त्यांनी
प्रशिक्षण घेतले होते. इथे विद्यापीठ पातळीवर सरकारी चौकटीच्याबाहेर
नव्याने पूर्ण विभागाची/ज्ञानशाखेची उभारणी करण्याचं काम मोठ्या तडफेने
त्यांनी सुरू केले. त्याचा एक भाग म्हणून नाशिक या पुरातनकालापासून
अस्तित्वात असलेल्या नगरीचे उत्खनन करायचं ठरलं होतं. श्री. साळींनी आणलेली
खापरं त्यांनी पाहिली आणि जोर्वेलाही छोटंसं उत्खनन करायचं असं ठरवलं.
१९५०
साली उत्खनन केल्यावर ही खापरं एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं;
पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने आणि तोपर्यंत
शास्त्रीय कालमापन पद्धती अस्तित्वात नसल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक
कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं हा प्रश्नच होता! नाशिकच्या उत्खननाने
मात्र हा प्रश्न समूळ सोडवला. तिथे सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या
थरांमधे अशीच रंगीत, नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले.
आत्तापर्यंत हे ही स्पष्ट झालं की या समाजाला लोखंड बनवायचं तंत्रज्ञान
अजून अवगत झालं नव्हतं. माहित होतं फक्त तांबं आणि दगड - म्हणून यांना
ताम्रपाषाणयुगीन वसाहती म्हणतात.
अशा तर्हेने महाराष्ट्रातील
वसाहतींचा इतिहास एकदम २००० वर्षे मागे गेला आणि इतिहासपूर्वकालीन
महाराष्ट्राच्या संशोधनाला जबरदस्त चालना मिळाली!
एकदा जोर्वेचा
शोध लागल्यानंतर आसपासच्या प्रदेशातून आणि पूर्ण पश्चिम आणि उत्तर
दख्खनच्या पठारावर तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातही अनेक
ताम्रपाषाणयुगीन वसाहती सापडल्या, सापडत राहिल्या. आणि डेक्कन कॉलेजच्या
पुढाकाराने जवळजवळ २० स्थळांचे लहानमोठ्या प्रमाणात उत्खननही झाले. यात
तापी खोर्यातील प्रकाश, सावळदा, बहाळ, टेकवडे, कवठे, गोदावरी-प्रवरा
खोर्यातील दायमाबाद, नेवासा, आपेगाव तसेच भीमा खोर्यातील शिरूरजवळ
इनामगाव, बारामतीजवळचं सोनगाव, थेऊर इत्यादी स्थळांचा प्रामुख्याने समावेश
होतो. या उत्खननांमुळे आज आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासपूर्व कालीन आदिम
वसाहतींचा चेहरामोहरा कसा होता हे सांगता येतं.
Picture1.jpg
(जाता
जाता थोडं विषयांतर:- या शोधाने एका व्यक्तीचं आयुष्यच पूर्ण बदलून टाकलं.
संगमनेरच्या तालुका डेव्हलपमेंट बोर्डमधे नोकरीला असलेल्या श्री. शंकर
अण्णाजी साळी या तरुणाचं. स्वतःची नोकरी सोडून हा चक्क
पुरातत्त्वशास्त्राच्या विद्याभ्यासामागे लागला. एवढंच नव्हे तर डेक्कन
कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून ASI (Archaeological Survey of India) मधे
चांगला हुद्दा पटकावला. आणि कालांतराने याच ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे
महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्थळ दायमाबाद याचे यशस्वीरित्या उत्खननही
केले!!)
तर महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख
वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज भटका आणि शिकारी
असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच आहे. आपल्याला
मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख वर्षांपूर्वीची
प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!), जुन्नरजवळ
बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील उत्खननात.
अशीच एक - थोडीशी नंतरच्या काळातील - वसाहत सापडली जळगाव जिल्ह्यात पाटणे
येथे. सुमारे २५ ते ३०,००० वर्षांपूर्वीच्या या हत्यारांबरोबरच रेघांनी
सुशोभित केलेलं शहामृगाच्या अंड्याचं एक टरफलही सापडलं..
ही अशी
लाखो वर्षं भटक्या अवस्थेत काढल्यानंतर सुमारे साडेचार हजार वर्षांपूर्वी
महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार व्हायला हळुहळू सुरूवात झाली.
भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं
आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू.
६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे
विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि गंगा यामधला बेलन खोर्याचा भाग
(ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य भारत.
आपल्या आधी
राजस्थान, गुजरात, माळवा या प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता.
तिथेही ही वाटचाल अश्मयुगाकडून शेतीकडे अशी सलग झाली. त्यांच्याकडूनच
उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख नर्मदेच्या दक्षिणेला रहाणार्या
मानवसमूहाला झाली असं दिसतं. या सर्व प्रसारामधे मात्र एका लोकसमूहाने
विविध ठिकाणी पांगून जाऊन, नव्या वसाहती करून शेतीची ओळख त्या त्या
प्रदेशाला करून दिली असं काही दिसत नाही. त्या त्या प्रदेशातील स्थानिक
लोकांनी शेजारच्या शेती करणार्या समाजांकडून हे नवं तंत्र आत्मसात करून
घेतलं.
असो. परत येऊया महाराष्ट्रातील आदिम वसाहतींकडे..
आपल्याकडील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा कालखंड सुमारे इ.स. पूर्व २४५० ते इ.स. पूर्व ९००/७०० असा आहे.
या
वसाहतींचा आढावा घेताना आपण एकत्रच या सगळ्या कालावधीचा विचार करणार आहोत.
अजूनही आपल्याला मध्याश्मयुगातून नवाश्मयुगात/ ताम्रपाषाणयुगात (म्हणजे
आदिमानव ते शेतकरी - पशुपालक) समाजाची वाटचाल दाखवणारा कुठलाही ठोस
पुरातत्त्वीय पुरावा महाराष्ट्रात सापडलेला नाहीये. आपल्याला उपलब्ध
असलेल्या उत्खनित पुराव्यावरून असे दिसते की गुजरातमधून आपल्याकडे या शेती
तंत्रज्ञानाचा प्रसार झाला असावा.
धुळे जिल्ह्यातली कवठे इथली
वसाहत अशा नव्याने शेती शिकलेल्या समाजाची प्रथम वाटचाल दाखवते. इ. स.
पूर्व २४५० च्या आसपासचं हे गाव हंगामी होतं. जेवढं शेतीवर तेवढंच पशुपालन
आणि शिकारीवर अवलंबून होतं. पूर्ण वर्षभर एकाच ठिकाणी मुक्काम करत नसल्याने
अत्यंत कमी श्रमात बांधल्या जाणार्या गोल झोपड्यांचा वापर ते करत. या
झोपड्यांच्या जमिनी थोड्याशा खोल खड्ड्यासारख्या केलेल्या असत (pit
dwellings). एका 'घरात' रहाण्याच्या खड्ड्याशिवाय कोंबड्या ठेवायला/
साठवणीसाठी इ. २-३ खड्डे असत.
कवठे येथील घर
kaothe.jpg
अशी हंगामी गावं लौकरच कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही पालटले.
आजवर
अशी १५०हूनही जास्त स्थळं उजेडात आली आहेत. जरी या सर्व वसाहती ग्रामीण
होत्या तरीही त्यांच्यातही फरक होते. यातली काही गावे बर्यापैकी मोठी
होती. दायमाबाद सगळ्यात जास्त - म्हणजे जवळजवळ ३०हेक्टर मोठं होतं आणि
त्याला तटबंदी होती तर इनामगाव आणि प्रकाश ५ हे. च्या आसपास. बाकीच्या
वस्त्यांचं आकारमान मात्र १ ते ३हे. च्या मधे होतं. यांमधे स्थायी
स्वरूपाची खेडी, हंगामी वाड्या, असे विविध प्रकार होते. या सगळ्या वसाहती
काळ्या मातीच्या (black cotton soil), चराऊ कुरणांच्या आणि जलस्रोतांच्या
सान्निध्यात वसलेल्या होत्या.
गावात आखीवरेखीव रस्ते बहुदा नसतच
पण आजच्या खेड्यांसारखंच घरांच्या मधल्या जागेचा वापर गल्लीबोळांसारखा केला
जात असावा. बहुतेक सगळी घरं चौकोनी आणि कुडाची असत. शिवाय बाभूळ, सागवान,
धावडा, खैर, बांबू, रोझवुड अशा झाडांची ला़कडे घरबांधणीत वापरली जात असत
(मुख्यतः खांबांसाठी). जमिनी मुरूम्,माती टाकून चांगल्या चोपून मग मातीने,
शेणाने किंवा क्वचित चुन्याने सारवलेल्या असत. बहुतेक घरं एक किंवा दोन
खोल्यांची. एका मोठ्या खोलीत मधे कुडाने पार्टिशन करून एका बाजूला चूल आंणि
साठवणीची जागा असंही बर्याच घरांमधे आढळून आलंय. अपवाद म्हणून काही घरं
४-५ खोल्यांची असत. ती कदाचित गावातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची असावीत.
सगळ्या घरांना छान सारवलेली अंगणं असत. घरांची छपरं गवताने शाकारलेली असत.
घरांमधे हमखास आढळणार्या गोष्टी म्हणजे चूल, साठवणाची सोय आणि
पाटा-वरवंटा. (त्या काळातला पाटा थोडासा रगड्यासारखा खोलगट आणि वरवंटा
म्हणजे गुळगुळीत गोटा असे..)
इनामगावला मिळालेल्या घरांचे आराखडे
inm.jpg
यात
सर्वात लक्षवेधक काय असेल तर साठवणीसाठी असलेल्या विविध सोयी.
आजच्यासारखंच बेभरवशी अर्धशुष्क हवामान तेव्हाही होतं. त्यामुळे वरकड धान्य
साठवणं तेव्हाही महत्त्वाचं असणार! साठवणीसाठी वापरण्यात येणारे भक्कम
मोठ्ठाले रांजण तर उत्खननांमधे सापडलेच आहेत. पण त्याशिवायही मातीत खड्डे
खणून त्यांना चुन्याचा गिलावा देऊन धान्य साठवले जात असे. शिवाय मातीचे गोल
कट्टे करून त्यात वाळू आणि बोरीचे काटे घालून (खालून उंदीर-घुशी लागू नयेत
म्हणून) त्यावर कणग्या ठेवत असावेत. काही खास चार लांब पाय असलेले रांजण ४
दगडांच्या टेकूने किंवा ४ खळग्यांमधे उभे करून त्यातही साठवण केली जात
असे. इनामगावला तर या सगळ्या घरोघरच्या साठवणीव्यतिरिक्त एक स्वतंत्र
धान्याचं कोठारच होतं. बहुतेक गावाच्या मालकीचं.
चूल म्हणजे काही
वेळा नालाच्या आकारात मातीने बांधून काढलेली पण बहुतेक वेळा एक उथळ खड्डा,
त्यात मध्यभागी भांड्याला आधार म्हणून एक दगड किंवा मातीचा उंचवटा. या
खड्ड्याचे काठ जमिनी पासून थोडे उचललेले - गरम राखबिख बाहेर सांडू नये
यासाठी. काट्याकुट्यांच्या सरपणाबरोबरच शेणाच्या गोवर्याही इंधन म्हणून
यात स्वाहा होत.
एरवी घरात भांडीकुंडी सगळी मातीची. या
गाडग्यामडक्यांचे प्रकार तरी किती! रांजण, हंड्या, तपेली, लोट्या
(तोटीच्या/ बिनतोटीच्या), छोटेमोठे वाडगे, थाळ्या, झाकणं, तसराळी, चंबू,
गडू, इ.इ.. यातले काही प्रकार सोडले तर खूपशी भांडी गेरू-लाल रंगाची. आणि
त्यावर काळ्या रंगाने ठसठशीतपणे काढलेली नक्षी - विशेषतः वाडग्यांवर. हे
वाडगे म्हणजे तत्कालीन 'टेबल वेअर' म्हणाना! त्यामुळे आज जशी टेबल वेअरमधे
विविध डिझाइन्स असतात, तसंच काहिसं! अगदी सुरुवातीच्या काळात भांड्यांवर
प्राणी, पक्षी यांची चित्रं आढळतात. नंतर मात्र रेघारेघांची किंवा फ्री हँड
नक्षी मोठ्या प्रमाणात दिसून येते. या भांड्यांबरोबरच छानपैकी चौकोनी,
लंबगोल अशा आकाराच्या पणत्यासुद्धा मिळतात.
(या लेखाच्या
प्रारंभालाच इनामगाव येथून मिळालेल्या एका संपूर्ण हंड्याचं छायाचित्र आहे
त्यावरून रंगाची कल्पना येईलच. त्या हंड्यावर एक हरीण/अॅन्टेलोप काढलेलंही
स्पष्ट दिसत आहे)
mlw ware.jpgbowls.jpglamps_0.jpg
रोजची
औजारं-हत्यारं बघायची झालं तर दगडाची जास्त आणि तांब्याची कमी (कारण
दगडाला असलेली जास्त धार आणि तांब्याची मर्यादित उपलब्धता). वाळूत घासून
घासून गुळगुळीत चकचकीत केलेल्या दगडाच्या कुर्हाडी, गारगोटीचे छिलके काढून
तयार केलेली सूक्ष्म पण अत्यंत धारदार पाती (ही लाकूड किंवा हाडाच्या
खोबणीत एकापुढे एक बसवून विळा, कोयता, सुरी अशांसारखी हत्यारं तयार
व्हायची!), तांब्याच्या कुर्हाडी, छिन्नी, तांब्याचे गळ, हाडांनी, दगडांनी
तयार केलेली बाणाची टोकं, असं काय काय!
लोक कपडेबिपडे घालत होते
की नाही हे समजायला फारसा पुरावा नाही. पण बहुदा भाजक्या मातीच्या
'टकळ्या' असाव्यात अशा काही वस्तू उत्खननांमधे मिळाल्यात. अर्थात इतर
प्राचीन समाजांप्रमाणेच इथेही नाना प्रकारचे अलंकार वापरात असलेले दिसतात.
भाजक्या मातीच्या, शंखाच्या, तांब्याच्या बांगड्या ;भाजक्या मातीची
कर्णभूषणे ; आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या मण्यांच्या माळा - पांढरे पट्टेरी
अॅगेट, केशरी कार्नेलियन, दुधाळ पांढरा चाल्सीडोनी, पारदर्शक स्फटिक,
लालसर/हिरवा जास्पर, हस्तिदंत, सोनं, तांबं, माती, शंख असे किती किती मणी
उत्खननांमधून मिळालेत.
उपजीविकेसाठी शेती, पशुपालन, मासेमारी,
शिकार, याच्याच जोडीला जंगलातून विविध गोष्टी गोळा करून आणणं (foraging)
असे वेगवेगळे मार्ग हे लोक अवलंबत असत.
आपल्याला पुरावा पाहून
आश्चर्य वाटतं पण ४००० वर्षांपूर्वीच दख्खनच्या पठारावर खरीप आणि रब्बी
पिकं घ्यायला सुरुवात झाली होती. विविध प्रकारची धान्यं, डाळी, कडधान्यं,
तेलबिया यांचा समावेश यात होता. गहू, जव, तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी,
राळं, मसूर, हरभरा, तूर, मूग, उडीद, कुळीथ, वाटाणा, वाल, अळशी, तीळ ही पिकं
नियमितपणे घेतली जात होती. गव्हासारख्या पिकाला पाणी लागतं म्हणून
इनामगावच्या लोकांनी नदीच्या पाण्याचा कालवा/ पाट काढून पुराचं जास्तीचं
पाणी शेतीला मिळावं असी व्यवस्था केली होती.
शेतीसाठी वापरात
आणलेली काही अवजारंही आपल्याला उत्खननात मिळाली आहेत. यात हरणाच्या
शिंगापासून (antlers) बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून
बनवलेलं छोटं नांगराचं काम करणारं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून
त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं seed drill (याला मराठीत काय
म्हणतात बरं?) यांचा समावेश आहे.
antler hoe.jpgseed drill.jpg
पाळीव
प्राण्यांमधे गाय-बैल, म्हशी, शेळ्यामेंढ्या, गाढवं, कोंबड्या, डुकरं, आणि
कुत्री, मांजरं यांचा पुरावा आढळतो. घोडा आढळतो पण तो अगदी शेवटच्या
कालखंडात (बहुदा दक्षिण भारतातल्या लोहयुगीन लोकांच्या संपर्कामुळे).
शिकार
करून आणलेल्या प्राण्यांची यादीही अशीच लांबलचक आहे - ८/९ जातींची हरणं,
रानडुक्कर, नीलगाय, अस्वल, माकड, वाघ, बिबळ्या, मुंगूस, ससा, रानमांजर,
कोल्हा, लांडगा, साळिंदर, घोरपड, खार, मगर, कासव, मोर, माळढोक, कबुतर, बदक,
खेकडे, मासे, इ.
या लोकांच्या आहाराचा मुख्य घटक हा गोमांस
होता. त्याच बरोबर इतर प्राण्यांचेही मांस, मासे, धान्य, कडधान्य हे होतंच.
याचबरोबर वस्तीच्या आसपास सहज उपलब्ध होणारी फळं (बोरं, जांभळं, आवळे,
शिंदीचा खजूर, चारोळ्या) पालेभाज्या (चाकवत, घोळ, मेथी) यांचाही समावेश
खाण्यात होत असणार असं पुरावनस्पतिशास्त्रीय पुरावा आपल्याला सांगतो.
या
सगळ्या रोजच्या उद्योगांशिवाय काही कारागिरीची कामंही केली जात. यात
प्रामुख्याने कुंभार, तांबट, मणिकार, लोणारी (चुना तयार करणारा), अशा
कारागिरांचा समावेश होतो. दगडांची हत्यारं बहुतेक सर्व कुटुंबं आपापलीच
बनवत.
हे सर्व 'कुटिरोद्योग' ज्याच्यात्याच्या घरातच चालत. त्याच्यासाठी वेगळं वर्कशॉप वगैरेची भानगड नव्हती.
इनामगावच्या
उत्खननात एक फार सुंदर कुंभाराचा आवा मिळाला. त्यात जास्तीची गरम हवा
निघून जाण्यासाठी, इंधनासाठी वेगवेगळ्या वाटा केलेल्या होत्या. या भट्टीमधे
६००-७०० डिग्री सेंटीग्रेड तापमान कायम ठेवून छान खणखणीत गाडगी भा़जली
जात. अशा प्रकारच्या भट्ट्या आणखीही असणार हे सरळ आहे. पुरावा म्हणजे
ढिगाने सापडणारी खणखणीत वाजणारी रंगीत नक्षीदार खापरं!
kiln.jpg
आणि
इतकंच तापमान, नियंत्रित करून हवा तितका वेळ ठेवल्याशिवाय तांबं तरी कसं
गाळणार? तांबं देखील छोट्या भट्ट्यांमधे गाळलं जायचं. अशुद्ध गाळ एकीकडे तर
शुद्ध रस खापराच्या मुशीत!
एकूणच ही गावं उपजीविकेच्या प्राथमिक
पातळीवर तरी स्वयंपूर्ण होती. असं असलं तरीही खिल्लारं आणी शेळ्यामेंढ्या
घेऊन निदान काही लोक तरी वर्षातील काही काळ चराऊ कुरणांच्या मागे भटकत
असणार. कारण उपजीविकेच्या दृष्टीने फक्त वस्तीच्या आसपासच्या पर्यावरणाचा
सतत उपभोग घेऊन त्या संसाधनांवर ताण पडू नये म्हणून बहुतेक प्राचीन समाज
असा 'भटका' मार्ग स्वीकारत. चराऊ कुरणांच्या जवळ सापडलेल्या अनेक हंगामी
छोट्या वस्त्या याचंच निदर्शक आहेत. शिवाय सामाजिक नातेसंबंध वाढवायचे
असतील तर आसपासच्या समाजाशी कायमस्वरूपी संपर्क ठेवण्याची गरज असते.
या
परस्पर संबंधांचा आणखी एक पुरावा म्हणजे दूरदूरच्या प्रदेशांतून आयात
केलेल्या गोष्टी. या दख्खनच्या पठारावर रहाणार्या ताम्रपाषाणयुगीन लोकांचे
अनेक प्रदेशांशी देवाणघेवाणीचे संबंध होते. उत्खननात सापडलेल्या खालील
गोष्टींची यादी पुरेशी बोलकी आहे:-
तांबे (राजस्थान/गुजरात); शंख
(गुजरातचा समुद्रकिनारा); सोनं (कोलार/हट्टी खाण?) सर्पंटाईन, अॅमेझोनईट
हे दगड (अनुक्रमे कर्नाटक व गुजरात), हस्तिदंत (कर्नाटक?), इ.इ.
दळणवळणाची
साधनं म्हणजे बैलगाड्या आणी होड्या (निदान मोठ्या नद्यांसाठी तरी) हे
नक्की आहे. कारण चक्क त्यांची चित्रंच सापडली आहेत मातीच्या भांड्यांवर!
शिवाय इनामगावला नदीकाठी एक छोटासा धक्काही मिळाला उत्खननात.
रांजणावर बैलगाडीचे रेखाचित्र
cart.jpg
हे
झालं रोजच्या जगण्याबद्दल, पोटाची खळगी भरण्याबद्दल! पण त्यापलिकडे
त्यांचं आयुष्य कसं होतं? सुरुवात करूयात त्यांच्या श्रद्धा-समजुतींपासून
(इथे 'धार्मिक' हा शब्द मी मुद्दाम टाळलाय - कारण या समाजाचे वैदिक किंवा
तत्सम known धर्माशी कुठलेही नाते नाही).
हे लोक मृतांचे दफन
करत. ते ही वेगळ्या स्मशानात नव्हे तर घराच्या/ अंगणाच्या जमिनीत खड्डा
करून. (फक्त बहाळ या गावाला नदीपल्याड वेगळं स्मशान होतं). मोठ्या (adult)
व्यक्तींचे दफन खड्डयात झोपवून केले जाई तर लहान मुलांचे दफन दोन मोठे
रांजण तोंडाला तोंड लावून तयार झालेल्या बंद जागेत मृतदेह ठेवून केले जात
असे. मोठ्या माणसांचे पाय घोट्यापासून कापले जात ('त्या' जगातून परत इकडे
येऊ नये म्हणून?). शिवाय त्याचा/तिचा अनंतातला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी
काही निवडक भांडी (आत कदाचित खाद्यपदार्थ असावेत) त्या दफनात ठेवली जात.
शिवाय मृताच्या शरीरावर माळ, बांगड्या इ. अलंकारही असत.
burial.jpg
बाकी
त्यांच्या दैवत संकल्पनेविषयी सलग सुस्पष्ट पुरावा नाही. पण विविध
प्रकारच्या स्त्री मृण्मूर्ती मिळतात. तेव्हा स्त्रीतत्त्वाची/ सुफलनाची
संकल्पना इतर कुठल्याही आदिम समाजाप्रमाणेच इथेही महत्त्वाची असणार यात नवल
नाही. शिवाय गुजरात, राजस्थान, माळवा इथल्या ताम्रपाषाणयुगीन
समाजांप्रमाणेच इथेही बैलाच्या छोट्या मृण्मूर्ती अनेक मिळाल्यात. बैल
कदाचित पुरुषतत्त्वाशी, शेती - समृद्धी या संकल्पनांशी निगडित असावा.
इनामगावात एका घराच्या जमिनीखाली एका कच्च्या मातीच्या छोट्या डबीत एक
शिरोहीन स्त्री मूर्ती व बैलाची मूर्ती मिळाली. ही निश्चितच कुठल्यातरी
धार्मिक विधीशी संबंधित असणार पण आता तो तपशील आपल्यासाठी कायमचाच हरवून
गेला आहे. याशिवाय एका मोठ्या रांजणावर एक अर्धा माणूस आणि कमरेखालचा भाग
एका वन्य प्राण्याचा (बहुदा बिबळ्या) अशीही एक आकृती आढळते. याचाही संबंध
त्यांच्या कुठल्या समजुतीशी असावा असा अभ्यासकांचा कयास आहे.
अग्निपूजेचाही
एक पुरावा मिळतो दायमाबादमधे. तिथे काही खड्ड्याच्या स्वरूपातली
अग्निकुंडे मिळाली आहेत. आणी त्यात जळालेली गाई-बैलांची हाडे व धान्याचे
दाणे सापडले आहेत.
हे लोक मातृसत्ताक होते की पितृसत्ताक हे
समजायला मार्ग नाही, पण ज्याला मानववंशशास्त्रात tribal म्हणतात तसे होते.
म्हणजे कुटुंब आणि कुल (clan) यांच्या सामाजिक चौकटीतच वावरणारे. उपलब्ध
पुराव्यावरून तरी यांच्यात सामाजिक विषमता होती, वर्गभेद होता असं दिसत
नाही. शहरीकरणाच्या आधीच्या या संस्कृतीत राज्यसंस्था, राजेपद असंही काही
असावं असं दिसत नाही. गावाचा कारभार गावप्रमुख पहायचा. त्याचा दर्जा
साहजिकच इतरांपेक्षा थोडा वरचा किंवा वेगळा. इनामगावच्या उत्खननात मिळालेलं
गावप्रमुखाचं घर ४-५ खोल्यांचं होतं पण याशिवाय त्या घरातून इतरांपेक्षा
वेगळी अशी कुठलीच वस्तू मिळाली नाही. फरक होता तो दफनांमधे. या घरातून
मिळालेली दोन पुरुषांची (बहुदा लागोपाठच्या पिढ्यांमधली) दफने ही
इतरांसारखी खड्ड्यात झोपवून नव्हे तर ४ पायांच्या साठवणीच्या रांजणाचा वापर
खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली होती. शिवाय या
मृतदेहांचे पाय कापण्यात आले नव्हते! आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावचं
धान्यकोठार या घराच्या मागच्याच बाजूला होतं. बहुदा त्याची देखरेख आणि
नियंत्रण हा गावचा प्रमुख करत असावा. (या अशा सामाजिक रचनेला इंग्लिश्मधे
chiefdom असं म्हणतात).
chief.jpg
हे असे समाज भारतात
इतर प्रदेशातही होते. हळूहळू यांना लोहतंत्रज्ञानाचा शोध लागला आणि इ.स.
पूर्व ५-६व्या शतकानंतर येणार्या शहरीकरणाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली
दिसते. अगदी विदर्भातही असाच सांस्कृतिक कालानुक्रम आढळतो. पण दख्खनच्या
पठारावर मात्र काही वेगळंच घडलं!
या लेखातल्या एकेका मुद्याबाबत सविस्तर वाचायला आवडेल. या विषयावर मराठीत फारच कमी वाचलय.
उदा.
या चुलीबाबतच. असे चारीबाजूने उघडे डिझाईन म्हणजे, भांड्याला सगळीकडून
उष्णता मिळणार. थडी असेल तर पुरा निवारा उबदार राहणार. पण अशी चूल खोलीच्या
मधेच करावी लागणार. भिंतीलगत असू शकणार नाही. मग वार्यापासून आडोसा कसा
करणार ?
पूर्वी महाराष्ट्राला दक्षिणापथ म्हणत होते म्हणे. ते कधी?
दक्षिणापथ म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील सर्व भूभाग. हे नाव आपल्याला पहिल्यांदा मौर्यकाळात आढळते.
इसपु १२०० च्या सुमारास महाराष्ट्रात दुष्काळ पडले याचे वेगळे पुरावे आहेत का?
द्रविडीयन लोकांबरोबर महाराष्ट्रीयन लोकांचा संबंध केंव्हा आला?
रामटेक भागात इतक्यात काही उत्खनने सुरु आहेत ती बरीच अलिकडची का?
सध्या महाराष्ट्रात कुठे सुरु आहेत उत्खनने?
जो
काही तुरळक/तुटपुंजा माहितीसमुह उपलब्ध आहे त्याच्या सहाय्याने अर्वाचीन
प्रकारचे तक्ते पहायला आवडतील - उदा. गव्हाचे उत्पादन (as a function of
time), घराचे क्षेत्रफळ, गावांच्या लोकसंख्या. अशा दृष्टीने काही उपलब्ध
आहे का?
दुष्काळ या मुद्यावरून खूप वाद झडलेत Deccan chalcolithic (म्हणजे हे दख्खनच्या पठारावर रहाणारे ताम्रपाषाणयुगीन समाज) च्या विषयात.
मुळात
दख्खनच्या पठारावर असं पुरापर्यावरणीय काम झालंच नाहीये. तर मग राजस्थानचा
पुरावा सगळीकडे तेवढाच ग्राह्य धरता येईल का यावर तज्ज्ञांमधे मतभेद आहेत.
शिवायही आणखी controversies आहेत, ज्या टाळून मी इथे एका सर्वसाधारण
पातळीवर एक गोषवारा लिहिलाय.
शिवाय जर दुष्काळामुळे या वसाहती
उजाड झाल्या तर मग फारसं वेगळं पर्यावरण नसलेल्या द्क्षिण भारतात असं का
झालं नाही? हा प्रश्नच आहे!! अर्थात राजस्थानचा पुरावा, आणी इनामगाव मधला
सांस्कृतिक/आर्थिक बदल या परिस्थितीजन्य पुराव्यामुळे सध्यातरी आपल्याला
अभ्यासकांचे म्हणणे मान्य करावे लागते.
हा दुष्काळ पडला होता का?
त्याचा कुठे किती जोर होता? मग वेगवेगळ्या प्रदेशात मानवसमूहांनी याला
वेगवेगळ्या उपायांनी तोंड दिले का? असे खूप म्हणजे खूप प्रश्न आहेत.
याच्यासाठी एक बर्यापैकी मोठा संशोधन-प्रकल्प हातात घ्यावा लागेल. शिवाय
याला तेवढाच भक्कम आधार लागेल तो कालमापन पद्धतीचा. भारतात ही एक मोठी अडचण
आहे. प्रकल्पाच्या पैशातून बाहेरच्या देशात नमुने पाठवायला तेवढे पैसे
असतातच असं नाही. आणि भारतातल्या प्रयोगशाळांमधे लांबच्या लांब
प्रतीक्षायाद्या असतात. हे फक्त साध्या कार्बन-१४ बद्दल झालं. TL Dating
बर्यापैकी बेभरवशी असतं, कारण त्याच्या नमुने गोळा करण्यापासून काय पथ्य
पाळायची याच्या हजार भानगडी असतात. AMS dating पण खूप कमी ठिकाणी उपलब्ध
आहे, शिवाय या सगळ्या मोठ्या संस्थांची स्वतःची शास्त्रीय कामं चालू असतात.
त्यात पाहुण्या पुरातत्त्वीय नमुन्याला मागच्या बाकावर बसवलं जातं. शिवाय
पूर्वी चालत असे, पण आता एकच तारीख मिळून चालत नाही. you need to have
series of dates to make your chronology acceptable on international
level.. इथे उत्खनन करण्यासाठी पैसे मिळवायला झगडावं लागतं, तर हे पुढचे
विचार कोण करणार? शिवाय प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार काम करत असतो/ते.
आत्ता या दख्खनच्या ताम्रपाषाणयुगावर माझ्याशिवाय कुणीच काम करत नाहीये!
द्रविडीयन/ दक्षिण भारतीय समाजाशी संपर्क असल्याचा पहिला पुरावा याच काळात मिळतो - विशेषतः कर्नाटकाबरोबर.
विदर्भाचा सांस्कृतिक कालानुक्रम ताम्रपाषाण, लोहयुग आणि इतिहासकाल असा सलग आहे.
तुम्ही
म्हणता तसे अर्वाचीन तक्ते करायचे प्रयत्न झालेत या संस्कृतीबाबत. पण इथे
किती लिहू? म्हणून खूप मुद्यांना काट मारली आहे.. खरं तर पूर्ण भारतात
सिंधू संस्कृतीच्या खालोखाल जर सर्वोत्तम संशोधनकार्य झालं असेल तर या
संस्कृतीविषयी झालंय. अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही इनामगावचं उत्खनन
भारतातलं सर्वोत्कृष्ट शास्त्रीय उत्खनन म्हणून प्रसिद्ध आहे. पण मराठीत
याविषयी अत्यल्प लिखाण उपलब्ध आहे. म्हणूनच याची तोंडओळख करून द्यायचा
खटाटोप केलाय. हे संशोधन माझ्या मराठीपणाचा एक महत्त्वाचा अभिमानबिंदू आहे!
माझ्या
दुर्दैवाने मी विद्यार्थी म्हणून पुरातत्त्वात पाऊल टाकण्याआधीच ही सर्व
उत्खनने संपली.. मी मात्र सर्वेक्षण करून या नाहीशा झालेल्या लोकांचा 'माग
काढण्याचं' काम पूर्वीच हाती घेतलंय. निदान पुढच्या २० वर्षात तरी आणखी
काहीतरी मिळावं, कुठलंतरी उत्तम उत्खनन करावं आणि या प्रश्नाचं उत्तर देता
यावं अशी मनापासून इच्छा आहे.
ही उत्खनन स्थळे पहायला फारशी अडचण नाही. फक्त आता तिथे काही दिसण्यासारखं नाही. पांढरीवर पडलेल्या खापरांशिवाय..
दायमाबाद
पुणतांब्याजवळ आहे. त्याचा काही भाग संरक्षित आहे. इनामगाव पुणे - शिरूर
रस्त्यावर न्हावरे गावाचा एक फाटा लागतो उजवीकडे, तिथे आत न्हावर्यापासून ४
किमी घोडनदीच्या काठावर आहे. गावापासून पांढर आणखी ३किमी उत्तरेला
नदीकाठाला आहे. सोनगावची पांढर आता बहुदा पूर्णपणे गेली असणार - नीरा,
कर्हा संगमाच्या बेटावर सोमेश्वर मंदिराच्या अगदी मागेच होती. पूर्वी ती
जमीन फलटणच्या निंबकरांचं रान/ गवळी राजाचं टेकाड म्हणून माहित होती आसपास.
प्रकाशला मीच गेली नाहीये अजून. पण तिथली पांढर अगदी मराठा काळात येऊन
संपते त्यामुळे हे अवशेष वरती किती दिसतात माहित नाही. वाळकी, थेऊर, इ. चे
मात्र आता नामोनिशाणही नाही... आताच्या कुठल्याही ग्रामस्थांना या ठेव्याची
जाण असेल असं वाटत नाही. फक्त इनामगावला मध्यंतरी ग्रामस्थ साईट म्युझियम
करणार असं ऐकत होते. पुढे काय झालं खरंच माहित नाही..
कालच्याच वाचनातील संदर्भ आठवला.
१.
'बॉर्न इन आफ्रिका' या पुस्तकाचा परिचय वाचला इंडियन एक्स्प्रेसच्या आय या
साप्ताहिकीमध्ये. त्यातील काही उल्लेख रोचक होते. परिचयातील मजकुरानुसार
हे पुस्तक म्हणते की, 'होमो सॅपियन्स आफ्रिकेतून सव्वालाख वर्षांपूर्वी
बाहेर पडले. पण त्यांचा नैसर्गीक परिस्थितीमुळे पराभवच झाला. मग बराच काळ
आफ्रिका हेच मानवी संस्कृतीचं पाळणाघर राहिलं.' हे मानवाचे पहिले स्थलांतर
मानले जाते. तो मानवही माझे चुकत नसेल तर आदिमानव अशा अवस्थेतील मानवच
होता. तुमच्या या लेखात म्हटले आहे की, 'महाराष्ट्रात आदिमानवाचा वावर
सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. हा अश्मयुगीन मानव समाज
भटका आणि शिकारी असल्याने त्याच्या घराबिरांचे अवशेष मिळणार नाहीत हे उघडच
आहे. आपल्याला मिळतात ती फक्त त्यांनी बनवलेली दगडांची हत्यारं. अशी ७ लाख
वर्षांपूर्वीची प्राचीन हत्यारं सापडली आहेत मोरगाव (हो, गणपतीचं मोरगाव!),
जुन्नरजवळ बोरी आणि नेवाश्याजवळ चिरकी नाला (अंदाजे ३.५ लाख वर्षं) येथील
उत्खननात.'
माझा यामुळं संभ्रम झाला आहे. आप्रिकेतून माणूस बाहेर
पडण्याच्या प्रचंड कालखंड आधी इथे माणूस होता, असे मानले/असले तर एकूणच
त्या उपपत्तीला आव्हान मिळते आहे.
२. शेतीच्या तंत्रज्ञानाच्या
उदयासंबंधात तुम्ही म्हटले आहे की, 'भारतात शेतीच्या तंत्रज्ञानाचा उगम
कमीतकमी ३ ठिकाणी स्वतंत्रपणे झाला असं आता संशोधकांना मान्य आहे. यातील एक
केंद्र बलुचिस्तान प्रांत (ई.स. पू. ६०००) - ज्यातून पुढे सिंधू संस्कृती
उदयाला येण्यास हातभार लागला, दुसरे विंध्य - कैमूर पर्वतातील अलाहाबाद आणि
गंगा यामधला बेलन खोर्याचा भाग (ई.स. पू. ६००० - ७०००) आणि तिसरे ईशान्य
भारत.' येथे नर्मदेच्या खोऱ्याचा उल्लेख येत नाही. मी असं ऐकलं आहे की,
नर्मदेच्या खोऱ्यात भारतीय उपखंडातील शेतीचा आरंभ झाला.
मी या
विषयाचा विद्यार्थी नाही. अभ्यासक/संशोधक तर नाहीच नाही. त्यामुळंही संभ्रम
असण्याची शक्यता आहे. वरच्या दुसऱ्या मुद्यात तर माझी माहितीही चुकीची
असण्याची शक्यता आहे. पण नेमके काय असावे याविषयेची कुतूहल जागे झाले आहे.
हे
प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे, कारण आउट ऑफ आफ्रिका हा अनेक लोकांचा
आवडता सिद्धांत आहे. अगदी कट्टर पुरातत्त्वशास्त्रज्ञ सोडून. पूर्वी
आफ्रिकेइतकी प्राचीन प्रागैतिहासिक स्थळे बाहेर मिळत नव्हती त्यामुळे असा
एक समज होता की आफ्रिकेतूनच आदिमानव सर्वत्र पसरला. पण मग नंतर जसजसे इतर
देशातील पुरावे मिळत गेले तसे या सिद्धांताला तडा गेला. अजूनही सर्वात
प्राचीन आदिमानव आफ्रिकेतच आढळतो. पण जगात इतर खंडांमधे आदिमानवाचा उगम
स्वतंत्रपणे झाला हे सिद्ध झालंय. (आदिमानवातही भरपूर 'जाती-जमाती' (i.e.
species variation) होत्या). अगदी याच वर्षी भारतातल्या आदिमानवाचा पुरावा
आणखी मागे गेलाय. आता १५ लाख वर्षांपूर्वी आदिमानवाचे अस्तित्व तमिळनाडूत
होते हे आपल्याला कळलंय.
सध्याच्या आउट ऑफ आफ्रिका वाल्यांचं
म्हणणं असं आहे की सव्वा लाख वर्षांपूर्वी बाहेर पडलेले होमो सेपिअन्स हे
जगभरात पसरले आणि 'स्थानिक आदिमानवांबरोबर मिसळले'. विशेषतः जिनोम रीसर्च
वाल्यांचं हे लाडकं मॉडेल आहे. अजूनही खरंखोटं काहीच सिद्ध झालेलं नाही.
आणि सगळ्यांनाच हे मान्य आहे असंही नाही. तुम्ही विकिपेडीआवर human
evolution, recent african origins of modern humans या एन्ट्रीज वाचा..
नर्मदा
खोर्याबद्दल-- हा फार जुना मतप्रवाह होता, आणी तो ही बरोबर नव्हता.
पुरातत्त्व हे नित्य नूतन संशोधनाने सतत updating होणारं शास्त्र आहे.
त्यामुळे कालचा पुरावा सुद्धा आज ग्राह्य असतोच असं नाही...
प्रकाश काळेल,
मराठी शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद. हा सरसकट वापरला जाणारा शब्द आहे की एखाद्या प्रदेशात?
स्वाती आंबोळे,
महाराष्ट्रात दहनाची पद्धत सुमारे २००० वर्षांपूर्वी (सातवाहन कालाच्या आसपास झाली असावी..
> पण मग नंतर जसजसे इतर देशातील पुरावे मिळत गेले तसे या सिद्धांताला तडा गेला.
> पण जगात इतर खंडांमधे आदिमानवाचा उगम स्वतंत्रपणे झाला हे सिद्ध झालंय.
> आता १५ लाख वर्षांपूर्वी आदिमानवाचे अस्तित्व तमिळनाडूत होते हे आपल्याला कळलंय.
तमिळनाडूची लिंक ईंटरेस्टींग आहे. ती अवजारे होमो ईरेक्टसची आहेत जो अफ्रिकेतुन १८ लाख वर्षांपुर्वी बाहेर पडला असे समजल्या जाते.
वेळ
मिळाला की पहिल्या दोन वक्तव्यांबद्दल अजुन सांगणार? अफ्रिकेतच पहिला मानव
निर्माण झाला असेल किंवा तिथुनच पसरला असेल असे नाही, पण ज्या ट्रेट्स
मानवाला इतर प्राण्यांपासुन वेगळे करतात (मुख्यतः बाह्य जगाच्या मॉडेल
मध्ये स्वतःला समभुत करायचे) या उत्क्रांत होणे सहज नाही. त्याकरता
म्युटेशन्सचा कोणतातरी एक जथ्था एकत्र यावा लागला असेल. ते दोनदा झाले
असल्याची शक्यता एकदा होण्यापेक्षा अर्थातच कमी आहे (पण दहा-पंधरा लाख
वर्षे उपलब्ध असल्याने अशक्यही नाही).
सर्व अफ्रिकेत्तर
पुरुषांमधे एक विविक्षीत म्युटेशन आढळते त्यावरुन अजुनही out of Africa
पुर्णपणे मोडीत नाही काढल्या जात. पुरातत्वनुषंगाने जास्त वाचायला नक्कीच
आवडेल.
चुलींबद्दल आणखीही बर्याच गोष्टी आहेत. पण फार तपशीलात जायचा मोह टाळला. नाहीतर एक आख्खं पुस्तक लिहावं लागेल!! फिदीफिदी
<<
झालं की नाही लिहून पुस्तक?
लिहा. आवडेल वाचायला.
तुम्ही दिलेला पहिला नकाशा आहे ना तो?
तिथे
तापीच्या वरच्या अंगाला जी स्थळं आहेत,(प्रकाशे या गावावर ४ ठिपके दिसतात)
तिथे बर्याच कुलांच्या कुलदेवता आहेत.ही सगळी गावे अत्यंत आडमार्गाला
आहेत. कित्येक "देवळे" गेल्या २०-३० वर्षांत बांधलेली. पूर्वी फक्त
झाडाखाली दगड अशी. पुजारीही भिल्ल. असे का? इथे कुलदैवत. म्हण्जे कुलाचे
मूळ कुटुंब इथे राहिलेले. मग हे गांव इतके मागास कसे? मागे यासंदर्भात
विचार करताना थोडी नेटाने माहिती शोधली तर ताम्रपाषाण युगापासून इथे वस्ती
असल्याची माहिती मिळाली. मग अगदी ग्याझेटापर्यंत येऊन सूरत ते बर्हाणपूर
रस्ता कसा तेही वाचून काढले होते.
माणूस वसला तो नद्यांच्या
काठाने. काळीवर शेती केली, अन पांढरी (उपजाऊ नसलेली जमीन) वर घरे बांधली,
स्मशान या अर्थी पांढरी शब्द वापरताट. याच गांवची काळी अन इथेच पांढरी..
फार इंटरेस्टिंग आहे हे सारं.
(चिनुक्स यांच्या लेखात ते
कौंडिण्य वगैरे वाचलं. हे कौण्डिण्य आद्य मेटॅलर्जिस्ट होते काय? भूमी
काण्डून तिच्यातून धातू मिळविणारे : सोने व तांबे. असं काहीसं कुठे तरी
ऐकण्यात आलेलं. अधिक माहिती वाचायला आवडेल. After all, ROOTS fascinate all
of us... तो धागा प्रतिसाद देऊन पुनर्जिवीत करावा काय?)
साठवणीच्या
रांजणाचा वापर खुर्चीसारखा करून त्यात मृतदेहाला मांडी घालून बसवून केली
होती. >> लिंगायत समाजात आजही मृतदेहाला याच पद्धतीने नेतात.
(त्यामुळे जिवंत असताना मांडी घालून झोपणे हे सोलापूर भागात तरी निषिद्ध
आहे!)
दुष्काळ कसा व किती पडला होता याची उत्तरे क्लायमॅटॉलॉ़जी देऊ शकते का?
<<दुष्काळ कसा व किती पडला होता याची उत्तरे क्लायमॅटॉलॉ़जी देऊ शकते का?>>
हो,
देऊ शकते पण मी इथेच वरती अस्चिग ला उत्तर दिलंय त्याप्रमाणे कालमापन
नमुन्यांसारख्याच अडचणी या अभ्यासात पण येणार. शिवाय राजस्थान, दख्खन,
उत्तर कर्नाटक अशा मोठ्या भूभागातून पुरेशी सॅम्पल्स घेऊन हे काम करायला
लागणार. यात भूगर्भशास्त्रज्ञ, पुरातत्वज्ञ, पुरावनस्पति आणि अशाच इतर
तज्ञांचा सहभाग लागणार. राजस्थानमधे तरीही हे काम बर्याच प्रमाणात झालं
आहे. दख्खनमधे नाही. त्यामुळे राजस्थानच्या निष्कर्षांचा पाया घेऊन आम्ही
पुढे जातो. शिवाय दुष्काळ पडला हे मान्य असलं तरी वेगवेगळ्या भूभागात
वेगवेगळ्या लोकसमूहांनी त्याला भिन्नभिन्न स्वरूपात तोंड दिलं असायचीही
शक्यता आहे.. हे सगळे धागेदोरे जुळवणं हे एका तज्ञसमूहाचे निदान काही दशके
पुरे पडणारे काम आहे.... कुठल्याच प्रश्नाला चटकन उत्तरं त्याची त्याच
पिढीत फार क्वचित मिळतात आमच्या शास्त्रात. एका रक्ताच्या थेंबापासून हजारो
असुर निर्माण व्हावेत तसं एका कामातून हजार दीर्घ प्रकल्प सुरू व्हावेत
असे प्रश्न उभे ठाकतात
कारातिनी
वगैरे विदेशी पुरापर्यावरणशास्त्रज्ञांनीसुद्धा आपल्या पश्चिम
किनारपट्टीचा अभ्यास करून मिळतेजुळते निष्कर्ष काढलेत आणि ते राजस्थानच्या
निष्कर्षांशी बर्यापैकी जुळतात. प्रख्यात पुरातत्वज्ञ म. के. ढवळीकर
(इनामगावचे उत्खनक) यांचं 'पर्यावरण आणि संस्कृती' नावाचं एक पुस्तक आहे.
त्यांचं ठाम म्हणणं आहे की भारतीय संस्कृतीचे चढउतार हे पर्यावरणाशीच
निगडित आहेत...
सिंधूसंस्कृतीचा नाश मात्र अशा कोणत्या एकाच
कारणामुळे झाला नाही. अनेक पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक, राजकीय घटक त्यात
असणार.. आणी खरंतर सिंधूसंस्कृतीचा नाश नाहीच झाला तर शहरीकरण लयाला गेलं,
लिपीचं, शहरी बांधणीच्या तंत्रज्ञानाचं विस्मरण झालं आणि परत एकदा सर्व
लोकसमूह ग्रामीण झाले. बहुतेक ठिकाणी हे ग्रामीण समाजच पुढे कालांतराने
लोहयुगात गेले आणि संस्कृतीचा प्रवाह खंडित झाला नाही... यात अनेको आतल्या-
बाहेरून आलेल्या समाजसमूहांची भर पडत गेली मात्र.
फारएण्डा, धन्यवाद
अरे
रांजण, मडकी करण्यासाठी चाकं होतीच/ असणारच. काही साठवणीचे रांजण
हातघडणीचे आहेत. एरवी सगळी भांडी मस्तपैकी चाकावर केलेली आहेत.
भांड्यांच्या आत हातात धरून चाकावर फिरवल्याने उठलेले स्ट्राएशन मार्क्स
(striation marks) असतात. त्यावरून हे कळतं
एक
प्रश्न - हे इनामगाव लोक सोडून गेल्याने अशा अवस्थेत राहिले हे कसे ठरवतात?
म्हणजे पुराच्या पाण्यात किंवा प्रचंड प्रमाणावर माती/गाळ वाहून गावच
त्यात गाडले गेले किंवा रोगाच्या साथीने तसे झाले हे सर्व ठरवण्याच्या काही
ठराविक पद्धती आहेत का?
दुसरे म्हणजे हे जे पुरावे मिळतात -
प्रामुख्याने खापरे व इतर वस्तू यावरून या लेखात आहे तशी काही अनुमाने
काढायची म्हणजे त्यावेळच्या हवामाना बद्दल, सामाजिक स्थिती बद्दलही बरीच
माहिती त्याबरोबर वापरावी लागत असेल. तो ही अभ्यास पुरातत्त्वखात्यातील
लोकांनाच करावा लागतो, की असे विविध विषयातील तज्ञ एकत्र काम करतात अशा
प्रोजेक्ट्स वर?
महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती
महाराष्ट्रराज्यस्थापनेचं
हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या
आचार्य अत्र्यांनी 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना
फक्त भूगोल आहे', असे उद्गार काढले होते. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व
मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा
वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी
उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा
प्रवासच आहे महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात
(इ.स. ५०५) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. ६११ सालातील बदामीच्या
शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला
महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे.
दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश.
दक्षिणेकडील प्रदेशाची नीटशी कल्पना उत्तरेकडील आर्यावर्तांत राहणार्या
आर्यांना नसल्यामुळे त्यांनी या अज्ञात प्रदेशाला दिशादर्शक असं मोघम नाव
दिलं.
दक्षिणापथ हे नाव तसं
पुरातन आहे आणि ते विंध्यपर्वताच्या दक्षिण परिसराच्या खालच्या प्रदेशास
लावण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व काळातील पेरिप्लुस (सागरी मार्गाचे
नकाशे) या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यांत दक्षिणापथ या देशास
Dakhinabhades असं नाव देऊन त्यांत भडोचपासून (Bargaza) द्रविड देशातील
(Damiriea) व्यापारी पेठेच्या शहरांपर्यंतचा अंतर्भाव केलेला आहे. हे जे
दामिरिच म्हणून शहर पेरिप्लुसांत लिहिले आहे, ते मार्कंडेय पुराणात
सांगितलेलं दामरह नावाचं शहर असावं. इ. स. ३३०च्या सुमारास राज्य करणारा
समुद्रगुप्त राजा आपल्या शिलालेखांत दक्षिणापथ म्हणजे नर्मदा नदीपासून थेट
कन्याकुमारीचा प्रदेश असं म्हणतो. याच्या पुढचा ६०० वर्षांनंतरचा राजशेखर
(इ.स. ९००-९४०) नावाचा ग्रंथकार हा आर्यावर्त आणि दक्षिणापथ या दोन
प्रदेशांच्यामधील मर्यादा रेवा नदी असल्याचं सांगतो. याच काळातला चालुक्य
कुळातील पहिला राजरज (इ. स. ९८५) हा दक्षिणापथाची मर्यादा नर्मदेपासून
रामाच्या सेतूपर्यंत नेऊन या दोन्हींमधील प्रदेश पहिल्या विष्णुवर्धनाने
(इ.स.६००) जिंकल्याचं सांगतो
निरनिराळ्या काळातल्या
ग्रंथकारांनी दक्षिणापथाची मर्यादा ही अशी सांगितली आहे. उत्तरमर्यादा
नर्मदा आणि दक्षिणमर्यादा मात्र अनिश्चित अशी दक्षिणापथाची स्थिती होती.
कधी कधी महाराष्ट्र व दक्षिणापथ ही दोन्ही नावं एकाच प्रदेशास अनुलक्षून
स्थूल अर्थानं वापरलेली दिसतात. या दक्षिणेकडील प्रदेशाची आर्यांना फारशी
माहिती नव्हती. त्यांच्या परिचयाचे प्रदेश म्हणजे आर्यावर्त आणि
मध्यप्रदेश. तिथेच त्यांचं मांत्रिक पठण, यज्ञकर्मं वगैरे चालत असे. या
देशाच्या पलीकडे कोणी आर्य गेलेच तर व्रात्य म्हणून पतित होत आणि पुन्हा
आर्यांच्या समाजात सामावून घेण्यासाठी त्यांना व्रात्यस्तोमासारखे विधीही
करावे लागत. आर्यावर्ताच्या बाहेर जाण्यासंबंधी असे सक्त निर्बंध
असल्यामुळे सामान्य जनतेचा चौफेर संचार नव्हता. दक्षिणेकडे जायचं म्हणजे
वनवासात जायचं असा प्राचीन काळी समज होता. या धार्मिक निर्बंधांबरोबरच
निसर्गही फारसा अनुकूल नसल्यानं दक्षिणप्रांत आर्यांच्या ताब्यात
येण्यासाठी उत्तरेकडील प्रदेशापेक्षा जास्त वेळ लागला. विंध्य, पुढे
सातपुडा, दोन्ही बाजूंस सह्याद्रीच्या डोंगराळ खबदाडी. असा खडतर प्रवास
उत्तरेकडील संपन्न व समृद्ध प्रांतांत सुखावलेले आर्य का ओढवून घेतील?
म्हणूनच पुष्कळ काळ दक्षिणेकडील प्रांत आर्यांच्या दृष्टीने दंडकारण्यच
राहिला.
महाराष्ट्राच्या वसाहतीसंबंधी एक पौराणिक आणि दुसरं
ऐतिहासिक, अशी दोन मतं मांडता येण्यासारखी आहेत. या दोन्ही मतांत काळाच्या
दृष्टीने फार अंतर आहे. यांपैकी पौराणिक मत आपण प्रथम पाहू. पौराणिक
दृष्टीने महाराष्ट्रातील वसाहत ऋग्वेदसूक्तांच्या संहितीकरणापूर्वी,
किंबहुना ऋग्वेदात उल्लेखलेल्या दाशराज्ञ युद्धापूर्वी झाली, असं म्हणता
येतं. पौराणिक मत डॉ. केतकर यांनी आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ग्रंथात
मांडलं आहे. महाराष्ट्राचे स्थूलमानाने अपरान्त, विदर्भ आणि दंडकारण्य असे
तीन भाग पडतात. त्यांपैकी पश्चिमेकडील अपरान्त (कोकणपट्टी) भृगु आणि
त्याच्या वंशजांनी फार प्राचीन काळी, म्हणजे भार्गवरामाच्या -
परशुरामाच्या- अवताराच्याही पूर्वी वसवल्याचं पुराणांवरून ठरतं. कोकण
म्हणजे परशुरामाची कर्मभूमी आणि परशुरामाच्या कथेशी कोकणातील कोकणस्थ,
देवरुखे, हैंग, नंबुद्री इत्यादी अनेक जातींचा संबंध येतो. भडोचचे जुने नाव
भृगुकच्छ असं आहे. परशुरामाचं पूजन कोकणात अनेक ठिकाणी होतं. सोपार्यात
आजही परशुरामाच्या अनेक मूर्ती आहेत. पश्चिम भाग जसा भृगुंनी तसा पूर्व भाग
अगस्त्यांनी वसवला. या दोन पट्ट्यांच्या मधला भाग मात्र शापदग्ध असल्याने
तितकासा वसाहतयोग्य नव्हता. इक्ष्वाकुवंशातील दण्डक नावाच्या राजाने
भृगुवंशातील च्यवन नावाच्या ऋषीचा अपमान केल्यामुळे ऋषीने दण्डक राजाला शाप
दिला. त्या शापाच्या प्रभावाने विंध्यापासून सेतुबंधापर्यंतचा प्रांत
अरण्यमय झाला. दण्डकारण्य या नावाची ही उत्पत्ती.
कोकणासंबंधी
निरनिराळ्या कथा पुराणांत आहेत. सह्याद्रीच्या उपप्रांतांत आपल्या
पर्वतप्राय लाटा आदळून त्याच्या उच्चत्वाच्या स्पर्धेनं सूड घेणार्या
समुद्रास परशुरामाने मागे हटवून आपल्यासाठी व आपल्या यज्ञकर्मासाठी भूमी
तयार केली आणि चैत्यपुलिन (चिपळूण) इथे स्थंडिल तयार करून त्यासाठी
कोळ्यांच्या जाळ्यांची जानवी करून त्यांना ब्राह्मणांची दीक्षा देऊन किंवा
चितेवरील प्रेतांत प्राणज्योती पेटवून त्यांना ब्राह्मण्य दिले वगैरे कथा
प्रसिद्ध आहेत. या प्रांतास पूर्वी अपरान्त म्हणत असत व त्याची मर्यादाही
मोठी, म्हणजे उत्तरेला आनर्तापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत, अशी होती. या
प्रांतास कोकण कधी म्हणू लागले, यासंबंधी ठाम प्रमाण मिळत नाही. नागांची
जी कुळं महाभारतात सांगितली आहेत, त्यांत कुकुण असं एक कूळ आहे, आणि ते या
प्रांतात खाली गोकर्णापर्यंत राहत होते, असा एक दाखला आहे. तेव्हा या कुकुण
नागकुलाचा आणि कोकण या नावाचा काही संबंध असू शकतो.
कोकण या
नावाची उपपत्ती आजपर्यंत पुष्कळांनी निरनिराळ्या प्रकारांनी दिली आहे.
जुन्या संस्कृत आणि फारसी ग्रंथांत कोकण हा शब्द निरनिराळ्या प्रकाराने
लिहिलेला आढळतो. संस्कृतात कुकुण, कुङ्कुण, कोङ्कण, कोंकण ही रूपं दिसतात,
तर फारसीमध्ये केङ्केम, कंकण, कोंकम् ही रूपं दिसतात. या कोकण शब्दाच्या
व्युत्पत्तीबद्दल अनेक मतप्रवाह दिसतात.
१. कोकण हा शब्द द्राविडी भाषेतून घेतला असावा.
२. कानडीत कोङ्कु असा एक शब्द आहे. त्याचा अर्थ उंचसखल जमीन असा आहे. कोङ्कु + वन = कोङ्कुवन = कोकण अशा मार्गाने हा शब्द आला असावा.
३.
फारसीमध्ये कोह (=पर्वत), कुण्ड (=खाच, खड्डा) असे दोन शब्द अहेत.
कोहकुण्ड = कोकुण्ड = कोकण अशा मार्गाने हा शब्द येतो. त्याचाही अर्थ
पर्वतांच्या खाचांचा प्रदेश असा होतो.
४. किम् + किण्वम् (कसली
ही वनस्पती?) अशा तर्हेचा प्रश्न पहिल्या वसाहतकारांनी उन्मादक ताडीसंबंधी
विचारला असावा व त्यावरून कोकण हा शब्द आला असावा.
५. कोंग नावाचे रानटी लोक प्रथम या प्रांतात वसले असावेत आणि त्यावरून या देशास कोंगवन (=कोकण) हे नाव मिळालं असावं.
कोकणाचा
व इतर बाह्य प्रांतांचा व्यापाराच्या दृष्टीनं संबंध फार पुरातन काळचा
आहे. इतर देशाचे व्यापारी हिंदुस्थानाशी जो व्यापार करत तो कोकणातूनच होत
असे. पुष्कळ अरबी शब्द जे दक्षिणेकडील भाषांत सापडतात, ते याच काळात आले
असावेत. इसवी सनापूर्वी चार शतकांपूर्वीपासून हा व्यापार चालत असावा.
सह्याद्रीच्या पलीकडे असलेलं दंडकारण्य मात्र या देवघेवीपासून अलिप्त होतं.
कोकणातील पुष्कळ बंदरांचा उल्लेख जुन्या लेखांमध्ये सापडतो. टोलेमी (इ. स.
१५०) याच्या Geographia या भूगोलविषयक ग्रंथात सिमुल्ल (Simulla) किंवा
तिमुल्ल (Timula) असा जो उल्लेख येतो, किंवा त्याही पूर्वी प्लिनीने (इ.स.
२००) पेरिमल (Perimula) असा जो उल्लेख केला आहे, किंवा कान्हेरीच्या
शिलालेखांत (इ. स. २००) चेमुल्ल म्हणून जे बंदर उल्लेखलेलं आहे, ते
कोकणातलं चेऊल किंवा चोल होय. याशिवाय पाल, कोल, कुड, राजपुरी, घोडेगाव या
गावांचाही उल्लेख आहे. उत्तरेकडचं शूर्पारक (सोपारा) हे तर मौर्यांच्या
राजवटीत एक स्तूप तिथे उभारण्याइतकं महत्त्वाचं होतं. या बंदरांतून माल आत
थेट नाशिक - पैठणपर्यंत पोहोचवला जात असे. काही यवन लोक बौद्धधर्म
स्वीकारून कोंकणात वस्ती करून होते, असं दिसतं. कारण कान्हेरी, नाशिक,
कार्ले, जुन्नर इथल्या विहारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या
होत्या.
टोलेमी हा कोकणाचे पुढीलप्रमाणे चार विभाग करतो -
१. सौराष्ट्र - उत्तर गुजरात
२. लारीके - लाट, दक्षिण गुजरात
३. आरिआके = मराठा देश
४. दामरिके = दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश .
यांपैकी
तिसरा जो आरिआके, किंवा आर्यक म्हणजे आर्यांचा प्रदेश, त्याचे पुन्हा तीन
भाग केले आहेत. पहिल्या भागात मुंबई व दक्षिणेचा काही भाग येतो. दुसरा भाग
उत्तर कोकण, दमणपासून खाली राजापूरपर्यंत, आणि तिसरा भाग दक्षिण कोकण. या
भागांना अनुक्रमे १. Arisake Proper २. Sadan's Ariake ३. Pirate Ariake
असं तो म्हणतो.
विदर्भ - अगस्त्य ऋषींचा प्रवास, त्यांचं विदर्भ
राजाच्या मुलीशी, लोपामुद्रेशी झालेले लग्न, कौंडिण्य नावाचा ऋषी,
भीष्मकाची राजधानी, नलदमयंतीचा विवाह वगैरे सर्व गोष्टी पौराणिक माहितीत
मोडतात. दक्षिणेकडील प्रदेशांचं आर्यीकरण सुरू झालं ते प्रथम विदर्भातच,
म्हणून विदर्भाचा संबंध आर्यांच्या ग्रंथांत यावा हे साहजिकच आहे. विदर्भ
हे जे नाव या प्रांताला मिळालं ते एका राजाच्या नावावरून मिळालं आहे.
यदुवंशापैकीच भोज या नावाची जी एक शाखा होती, त्या शाखेचं राज्य या
प्रांतावर होतं. त्या शाखेत विदर्भ भोज नावाचा एक राजा होऊन गेला व
त्याच्यावरूनच या प्रदेशाला विदर्भ हे नाव मिळालं. ऋषभदेव नावाचा जो राजा
होता त्याला नऊ मुलगे होते व त्यानं आपल्या नऊ पुत्रांना स्वत:चं भरतखंडाचं
राज्य वाटून दिलं. जो देश ज्या पुत्रास मिळाला त्या देशास त्या मुलाच्या
नावावरून नाव मिळालं. कुशावर्त, इलावर्त इत्यादी मुलांमध्ये विदर्भ
नावाचाही एक मुलगा होता व त्याच्या वाट्यास हा देश आला, म्हणून त्याला
त्याचं नाव मिळालं, अशीही एक कथा प्रचलित आहे. त्याच विदर्भानंतर काही
पिढ्यांनी भीम आला. अजपत्नी इंदुमतीचा भाऊ भोज याच विदर्भ राजाच्या
वंशातला. त्याच वंशात क्रथकैशिक, भीष्मक, रुक्मी व चंपू रामायणाचा कर्ता
भोज हे सर्व होऊन गेले. या प्रांतातील स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबद्दल
वगैरे प्रसिद्ध असत. म्हणून इथल्या राजकुलातील कन्येशी विवाह करायला अनेक
राजे उत्सुक असत. या सर्व पौराणिक संदर्भावरून इतकं स्पष्ट होतं की,
विंध्यदक्षिण प्रांतात आर्यसंस्कृती सर्वप्रथम विदर्भातच रुजली. प्रथम या
प्रांताचं आर्यीकरण पूर्ण झालं आणि सरस्वतीदृषद्वतीच्या काठावर जे
ब्रह्मकर्म चाले, तेच ब्रह्मकर्म वर्धानदीच्या काठी सुरू झालं.
विदर्भास
वर्हाड असंही म्हणतात. वर्हाड हा शब्द विदर्भावरून आला असावा, असं वाटणं
साहजिक आहे, परंतु वर्हाड आणि विदर्भ हे दोन्ही शब्द वर्णपरिणतीच्या
दृष्टीनं एकच समजणं अवघड आहे. अबूल फजल हा आपल्या ऐनेअकबरी या ग्रंथात
वर्धातट हे या प्रांताचं नाव देतो. वाचस्पत या ग्रंथात विगता: दर्भा: -
कुशा: यत: असा विदर्भ या शब्दाचा विग्रह केला आहे. राजवाडे हे त्या शब्दाचे
वर्धा + आहार असे दोन भाग पाडून वर्हाड या शब्दाची व्युत्पत्ती सांगतात.
या
प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात
कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे
गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस
आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख
सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख
महाभारतात आहे
या प्रांतांचे उल्लेख फार
प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या
ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे
नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग
(पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात.
महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात
आहे.
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे - अश्मक
विदर्भाची
विदर्भ, कैशिक, भोज, भोजकट, वर्धातट व महाराष्ट्र अशी सहा नावं आहेत, व
विदर्भ आणि महाराष्ट्र ही नावं समान अर्थानं वापरली आहेत. त्याला आधारही
जुन्या ग्रंथांत मिळतो. राजशेखर कवीच्या बालरामायण नावाच्या नाटकात एक
प्रसंग आहे. पुष्पक विमानात बसून श्रीराम, सीता व सुग्रीव हे तिघं लंकेहून
परत जात असता सुग्रीव प्रत्येक देशाचं वर्णन करतो -
सुग्रीव - भरताग्रजायमग्रे महाराष्ट्रविषय: ।
राम - सोऽयम् सुभ्रु परो विदर्भविषय: सरस्वतीजन्मभू: ।
सीता - यत्रोत्पना मे पितामहश्वशुरस्य गृहिणीन्दुमती ।
त्याचप्रमाणे
मुरारी हा कवीही आपल्या अनर्घ्यराघव या नाटकात इदमग्रे
महाराष्ट्रमण्डलैकमण्डनं कुण्डिननाम नगरम् । असा, कुंडिननगर ही
महाराष्ट्राची राजधानी म्हणून उल्लेख करतो.
विदर्भ म्हणजे
महाराष्ट्र असे जसे उल्लेख सापडतात तसेच अपरान्त म्हणजे महाराष्ट्र असे
उल्लेखही सापडतात. यावरून महाराष्ट्र या देशाची व्याप्ती नीट ठरली नव्हती,
असं दिसतं. महाभारतात गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा
महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपभागांचा उल्लेख आहे. गोपराष्ट्र म्हणजे
गोपांचा देश. मथुरेजवळच्या गोपांचे हे भाऊबंद असावेत. नाशिकजवळचा हा प्रदेश
होता. दुसरं मल्लराष्ट्र. हे मल्ल रानटी लोक होते. त्यांचं निर्दालन
खंडोबानं केलं म्हणून त्याला मल्लारी हे नाव मिळालं. मल्ल हा शब्द अनेक
नावांच्या शेवटीही येतो. मल्ल याचा अर्थ पर्वत असाही होतो, तेव्हा
मल्लराष्ट्र म्हणजे डोंगराळ प्रदेश, असा अर्थही संभव आहे. गोपराष्ट्राच्या
खाली हे मल्लराष्ट्र होतं. पांडुराष्ट्र म्हणून जो उल्लेख येतो, तो
पाण्ड्यांच्या प्रदेशाबद्दल आहे. सध्याच्या तामिळनाडूतील हा भाग. याचाही
अंतर्भाव तेव्हा महाराष्ट्रात होत असावा. याशिवाय, समुद्रगुप्ताच्या एका
शिलालेखात देवराष्ट्राचा उल्लेख आहे. हे देवराष्ट्र सातारा जिल्ह्यात
दक्षिणेला आहे. ही सर्व राष्ट्रं व अस्मक, अपरान्त, विदर्भ मिळून
महाराष्ट्र बनला होता.
आर्यांची जी वस्ती दक्षिणेस झाली ती काही
एकदम व सर्व ठिकाणी सारखी अशी झाली नाही. क्रमाक्रमानं सावकाश व दीर्घ
कालावधीनं जसजसं तिथलं जंगल कमी होऊन भूभाग वसाहतयोग्य होऊ लागला तसतसे
आर्य आपला शिरकाव दक्षिणेत पुढे पुढे करू लागले. स्थूलमानानं व निसर्गाचे
निर्बंध लक्षात घेता महाराष्ट्राचे भाग उत्तरेकडून दक्षिणेकडे
नागपूर-विदर्भ, गोदाकाठ, भीमाकाठ, कृष्णाकाठ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण इतके
पडतात, व याच क्रमाने आर्यांनी तिथे वसाहती केल्या. याला अपवाद फक्त कोकण.
देशापेक्षा फार अगोदर कोकणपट्टीवरील प्रांत वसवला गेला होता. एवढंच नव्हे
तर व्यापारउदीम वगैरे व्यवहाराच्या दृष्टीनं इतर तत्कालीन देशांतील
लोकांनाही तो परिचित झाला होता. शिवाय, उत्तरेचं दळणवळण कोकणाशी होण्यास
तिथला मार्गही विशेष बिकट नव्हता. उत्तरेकडील आर्य किंवा पुढे जे जे लोक
वसाहतीसाठी दक्षिणेत येऊ शकले ते या कोकणपट्टीच्या मार्गानेच येत. तेव्हा
हा प्रांत फार अगोदर वसवला गेला, यात शंका नाही.
आर्यांच्या
पूर्वी विंध्याच्या दक्षिणेस कोण लोक राहात होते व ते तेथे कुठून आले
यासंबंधी संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. युरोपीय संशोधकांचा असा समज आहे
की, आर्य ज्या वेळी आपल्या मूळ वसतिस्थानाहून निघाले व इतर वसाहतयोग्य
प्रांतांत ठिकठिकाणी राहू लागले, त्या वेळी जशी एक लोकक्रांती झाली, तशीच
जबरी लोकक्रांती मध्य आशियातून द्राविडी किंवा सुमेरी अथवा तुराणी
संस्कृतीचे लोक आर्यांच्या पुष्कळ पूर्वी इतस्तत: फ़िरू लागले त्या वेळी
झाली. तेच लोक आर्यांप्रमाणे हिंदुस्थानाकडे वळले आणि उत्तरेकडील
पर्वतांच्या दर्याखोर्यांमधून आत शिरून राहिले. मागाहून जसजसा आर्यांचा
रेटा येऊ लागला तसतसे ते उत्तरेकडील डोंगरांच्या खबदाडीत व दक्षिणेकडे
विंध्यपार होऊ लागले. अशा रीतीनं दक्षिणेकडे दोन लोकांच्या निरनिराळ्या
भिन्न काळी वसाहती झाल्या. एक आर्येतर द्राविडी वगैरे लोकांची आणि दुसरी
आर्यांची. या दोन्ही वसाहतींचे नक्की काळ सांगणं कठीण आहे.
महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-5
दक्षिणेकडील
वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व
वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती. पहिल्या अनार्यांच्या व दुसर्या
आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व
म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही संशोधकांना मान्य नाही.
उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार आला. कुश, अर्जुन, भीम या
आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक कर्कोटक नावाचा वंशज
काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा असलेला नील जातीनं नाग
होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर काही पुराणांत नागांचा
उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक बरेच पुढारलेले होते,
कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग लोकांमध्येच केला असल्याचं
काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध मध्ये बसलेला आणि त्याच्या
भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची फणी घेतलेले असे नाग लोक
बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग लोक फार पूर्वी उत्तरेतून
दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं वसतिस्थान असा उल्लेख
म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात आर्यांच्या आधी नाग
लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील प्रांतांचा व
विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड, भिल्ल, वारली,
कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या वसाहतीही
महाराष्ट्रात होत्या.
पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत
विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील
कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व
पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत.
कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ
ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.
पाणिनीनंतरच्या
काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले.
उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या
बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक
ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या
मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं
खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले.
त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश,
विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर,
कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.
ब्राह्मणांप्रमाणेच
आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात
आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि
पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म,
स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या
प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य
शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक
आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा
होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या
पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या
राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा
तर्हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली
महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व
महाराष्ट्री होती.
क्षत्रियांपैकी दक्षिणेत राष्ट्रिकही आले.
अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून उल्लेखलेले आहेत ते हे
राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच राजा म्हणून अभिषेक
करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे असे संबोधीत.
शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली वसाहत दक्षिणेत
बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून सौंदत्तीपर्यंतच्या टापूत
केली.
वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश उत्तर कुरू आणि उत्तर मद्र
यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश. पुण्याच्या दक्षिणेकडे हे
वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ भाषा अपभ्रंश व या भाषेसह
ते खाली उतरल
दक्षिणेकडील वसाहतींमध्ये काळाच्या दृष्टीनं दोन
स्थूल भाग पडतात. पहिला पाणिनिपूर्व वसाहती व दुसरा पाणिन्युत्तर वसाहती.
पहिल्या अनार्यांच्या व दुसर्या आर्यांच्या. सर्व अनार्य लोकांत नाग
लोकांची संस्कृती उच्च समजली जात असे, व म्हणून त्यांना अनार्य म्हणणं काही
संशोधकांना मान्य नाही. उत्तरेकडेसुद्धा त्यांचा आणि आर्यांचा संबंध फार
आला. कुश, अर्जुन, भीम या आर्यांचे आणि नागांचे शरीरसंबंध झाले. नागांचा एक
कर्कोटक नावाचा वंशज काश्मीरात राज्य करत होता. काश्मीरचा पहिला राजा
असलेला नील जातीनं नाग होता असा राजतरंगिणीत उल्लेख आहे. महाभारत व इतर
काही पुराणांत नागांचा उल्लेख अनेकवेळा आला आहे. बुद्धाच्या काळात नाग लोक
बरेच पुढारलेले होते, कारण गौतमबुद्धानं आपल्या मताचा प्रसार या नाग
लोकांमध्येच केला असल्याचं काही भित्तिचित्रांवरून स्पष्ट होतं. गौतमबुद्ध
मध्ये बसलेला आणि त्याच्या भोवती कमरेवर नागाचं वेटोळं आणि डोक्यावर नागाची
फणी घेतलेले असे नाग लोक बसलेले, असा देखावा या चित्रांमध्ये आहे. हे नाग
लोक फार पूर्वी उत्तरेतून दक्षिणेत स्थायिक झाले होते. पाताळ हे त्यांचं
वसतिस्थान असा उल्लेख म्हणूनच अनेक ग्रंथांत सापडतो. पाणिनीपूर्व काळात
आर्यांच्या आधी नाग लोकांचा प्रवेश दक्षिणेत झाला. नागांचा आणि दक्षिणेकडील
प्रांतांचा व विशेषत: पश्चिमेकडील कोकणाचा जास्त संबंध आला. याशिवाय गोंड,
भिल्ल, वारली, कोळी, वध्र, मल्ल, काथोडी, कातकरी या एतद्देशीय लोकांच्या
वसाहतीही महाराष्ट्रात होत्या.
पाणिनीपूर्व काळात आर्यांची वसाहत
विंध्याच्या खाली नव्हती. कारण पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये दक्षिणेकडील
कोणत्याही देशाचा उल्लेख नाही. मात्र कात्यायनाच्या वार्तिकांमध्ये व
पातंजलीच्या महाभाष्यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचे स्पष्ट उल्लेख आहेत.
कात्यायन व पाणिनी या दोघांमध्ये तीनशे वर्षांचा काळ होता. पाणिमीचा काळ
ख्रिस्तपूर्व ७०० आहे. म्हणजे आर्यांचा दक्षिणेशी संबंध त्यानंतरचा आहे.
पाणिनीनंतरच्या
काळात आर्य व त्यांच्यावर उपजीविका करणारे काही अनार्य महाराष्ट्रात आले.
उत्तर भारतातील राजांच्या जुलमांना कंटाळून, धार्मिक कर्मकांडांवर आलेल्या
बंधनांमुळे आणि जैन व बौद्ध धर्माच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक
ब्राह्मणांनी देशांतर केलं. सारस्वत ब्राह्मण पश्चिमेकडील अपरान्ताच्या
मार्गानं खाली उतरले तर नंबुद्री ब्राह्मण पूर्वेकडील कलिंगाच्या मार्गानं
खाली उतरले. त्याच वेळी काही ब्राह्मण विदर्भात स्थायिक ज़ाले.
त्यांच्यापैकी काही खाली खानदेश, नगर व नाशिक प्रांतात उतरले. खानदेश,
विदर्भ या प्रांतातेल यजुर्वेदीयांची वसती जुनी असावी. नाशिक, जुन्नर,
कान्हेरी येथील शिलालेखांत हे उल्लेख सापडतात.
ब्राह्मणांप्रमाणेच
आर्यांपैकी क्षत्रिय, वैश्य, शूद्र व इतर घटकही दक्षिणेकडे महाराष्ट्रात
आले असावे. उत्तरेकडील महापद्मादि दुष्ट शूद्र राजांच्या, जैन-बौद्धादि
पाखंडांच्या व व्रात्यशूद्रादि उत्पथांच्या जुलुमाला कंटाळून स्वधर्म,
स्वराज्य व स्वातंत्र्य यांचा अनुभव घेण्यास दक्षिणारण्यात बौद्धकालाच्या
प्रथम ज्वानीत म्हणजे शकपूर्व सहाशेच्या सुमारास वसाहती करण्यास आर्य
शिरले, असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहून ठेवलं आहे. मगधातून जे लोक
आले ते महाराष्ट्रीय होत. या महाराष्ट्रीय शब्दाचाच अपभ्रंश महरट्ट असा
होतो. महाराष्ट्रिक आणि महाराजिक हे एकच. यांचा उल्लेख महाराजाष्टन् या
पाणिनीच्या सूत्रांत आला आहे. हे क्षत्रिय होते. यांची व पुढे उल्लेखलेल्या
राष्ट्रिक व वैराष्ट्रिकांची गणराज्ये होती. त्यांत गणनायक असत. अशा
तर्हेचा एक गणनायक नाणेघाटातल्या कोरीव लेण्यांत खोदला असून त्याखाली
महारठीगनकयिरो (महाराष्ट्रीगणकवीर:) असा निर्देश आहे. यांची भाषा मागधी व
महाराष्ट्री होती.
क्षत्रियांपैकी दक्षिणेत
राष्ट्रिकही आले. अशोकाच्या शिलालेखात (इ. पू. ३२७) जे रास्टिक म्हणून
उल्लेखलेले आहेत ते हे राष्ट्रिक. यांचा मूळ देश कुरुपांचल. राष्ट्रिकांनाच
राजा म्हणून अभिषेक करून घेण्याची पात्रता असे आणि त्यांनाच अभिषिक्त राजे
असे संबोधीत. शौरसेनी ही या राष्ट्रिकांची बोली होती. या लोकांनी आपली
वसाहत दक्षिणेत बेळगावाकडे, सोलापुराकडे, स्थूलमानाने बीडपासून
सौंदत्तीपर्यंतच्या टापूत केली.
वैराष्ट्रिकांचा मूळ प्रदेश
उत्तर कुरू आणि उत्तर मद्र यांच्यामध्ये असणारा विराट् या नावाचा देश.
पुण्याच्या दक्षिणेकडे हे वैराष्ट्रिक स्थायिक झाले. वैराष्ट्रिकांची मूळ
भाषा अपभ्रंश व या भाषेसह ते खाली उतरल
महाभारतात देशांच्या नावांची जी एक यादी दिली आहे, त्या यादीत विदर्भानंतर
रूपजीविक व अश्मक ही दोन राष्ट्रं दिली आहेत. महाराष्ट्राच्या आसपासचे
रूपजीविक हे लोक कोण असावेत, याबाबत नक्की सांगता येत नाही. अश्मक हे
आधुनिक मराठ्यांचे पूर्वसंबंधी आहेत. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला
बौद्धग्रंथांत मिळतो. बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध असलेल्या ज्या सोळा
जमातींची यादी बौद्धग्रंथांत दिली आहे, त्यात अश्मक हे नावही आहे. त्या
वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे.
अश्मकांची राजधानी पैठण होती.
याशिवाय भोज,
महाभोज, सत्तीयपुत्त, पेत्तोनिक, केरळपुत्त, पाण्डय, चोल इत्यादी
दक्षिणेकडील लोकांचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात आला आहे. भोज हे मुळचे
मथुरेचे. भोसले हे आडनाव भोज या शब्दावरूनच आलं आहे. मथुरेजवळच सात्वत
नावाचे लोक राहत. सत्तीयपुत्त म्हणजे सात्वतपुत्र. सात्यकी हा सात्वत
कुळातच जन्मला. यादवांचा आणि सात्वतांचा संबंध होता. पेत्तेनिक म्हणजे
प्रतिष्ठानचे, अर्थात पैठणकडील लोक. पाण्ड्य हे दक्षिणेकडील. त्यांचा
उल्लेख कात्यायन आपल्या वार्तिकांत करतो.
वैश्यांपैकी
दक्षिणेत वसाहत करण्यास जे आले त्यांच्यामध्ये मुख्य आभीर होते. आभीर
मूळचे उत्तरेकडचे. ते सिंधुनदीच्या काठी राहत असत, असा महाभारतात उल्लेख
आहे. त्यांचा आणि तत्कालीन आर्यांचा फारसा सलोखा नसावा. त्यांच्याकडे ते
शत्रुत्वाचा नजरेनं पाहत असत. सरस्वती नदी जी एकदम अदृश्य झाली ती या आभीर
लोकांच्या दुष्टपणामुळेच, परंतु त्यांचा मूळचा युद्धप्रिय असा स्वभाव
असल्यानं त्यांची गणना चांगल्या योद्ध्यांमध्ये होत असे, व ते दस्यू
जातीतले असूनसुद्धा त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आर्य त्यांना आपल्या
सैन्यात सामील करून घेण्यास उत्सुक असत, असं महाभारतात सांगितलं आहे.
द्रोणाचार्यांनी जो सुवर्णव्यूह रचला त्यात या आभीर जातीच्या दस्यूंना
त्यांनी प्रमुख स्थान दिलं होतं. दुसर्या एका आभीरांच्या टोळीनं अर्जुन
द्वारकेहून श्रीकृष्णाच्या विधवापत्नींबरोबर परत येत असताना त्यांच्यावर
हल्ला केल्याचं महाभारतात लिहिलं आहे. अभीरांना लुटारू, गवळी, गुराखी,
म्लेंच्छ इत्यादी नावांनी महाभारतात संबोधलं आहे. बाप ब्राह्मण आणि आई
अम्बष्ठ यांपासून झालेल्या संततीस मनुस्मृतीत आभीर असं संबोधलं आहे.
यावरून
असं लक्षात येतं की, आभीर कोणीतरी कडवे, लढवय्ये, सतत फिरणारे असे लोक
असावेत. आणि इतर शक, ग्रीक, यूएची, कांबोज इत्यादी जातींचे लोक जसे
हिंदुस्थानात उतरले, तसे त्यांच्याबरोबर हेही उतरले असावेत, व त्यानंतर
पंजाबात त्यांनी सिंधू नदीच्या काठी वस्ती केली असावी. हे साधारण इसवी
सनाच्या सुरुवातीला घडलं असावं. दुसर्या व तिसर्या शतकांतील शिलालेखांत
आभीरांसंबंधी उल्लेख सापडतात. इ. स. १८१मधील क्षत्रप राजा रुद्रसिंह याच्या
लेखात रुद्रभूति नावाच्या त्याच्या आभीर सेनापतीचा उल्लेख आहे. शिवदत्ताचा
मुलगा ईश्वरसेन हा आभीर होता अशी माहिती इ. स. ३००च्या नाशिकच्या
लेण्यांतल्या शिलालेखात मिळते. इ. स. ३६०मध्ये समुद्रगुप्ताने अलाहाबाद इथे
एका स्तंभावर एक लेख कोरवला होता. गुप्त साम्राज्याच्या मर्यादेपलीकडे
दक्षिणेस आणि नैऋर्त्येस राजस्थान आणि माळवा प्रांतांत मालव आणि आभीर या
दोन जाती नांदतात असं या लेखात म्हटलं होतं. पंजाबात सिंधू नदीच्या काठी
इसवी सनाच्या सुरुवातीला आभीर लोक राहत होते, असं मानलं तर त्यांना
माळव्यात पोहोचायला तीनशे वर्षं लागली. यांपैकी काही लोकांनी तिथेच स्थायिक
होण्याचं ठरवलं असावं, हे नाशिकच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. झांशीच्या
दक्षिणेस अहिरवाड आणि अहारवाड अशी जी दोन गावं आहेत, ती संस्कृतातील
आभीरवाटिका या शब्दावरून आली आहेत. काही टोळ्यांनी इथे राज्यं स्थापन केली
असावीत, आणि काही टोळ्या पुन्हा दक्षिणेस आणि पश्चिमेस गेल्या असाव्यात.
कारण आठव्या शतकात ज्या वेळेस सौराष्ट्रावर हल्ला झाला त्या वेळी तो प्रांत
आभीरांच्या ताब्यात होता, असं एन्थोव्हेन आपल्या Castes and Tribes in
Bombay Presidency या पुस्तकात म्हणतो. हेच आभीर लोक दक्षिणेकडे आल्याचा
पुरावाही तो देतो. खानदेशातील असीरगड हा अस-अहीर या आभीर जातीतल्या
पुरुषानं बांधल्याचं फेरिस्ता आपल्या इतिहासात लिहितो. दक्षिणेत सहाव्या
सातव्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजे राज्य करत होते. त्यांच्या राजवटीनंतर
आभीरांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली, असा उल्लेख काही पुराणांत सापडतो.
पुराणांमध्ये
आभीर राजे म्हणून ज्यांचा उल्लेख येतो, त्यांच्यापैकीच एक शाखा
त्रैकुटकांची असावी. इ. स २५०च्या सुमारास क्षत्रप कुलानंतर त्यांचा उदय
झाला. अणि हैहय या नामाभिधानानं त्यांनी आपलं राज्य स्थापन करून त्रिकुट या
शहरास आपली राजधानी केली. हे घडलं इ. स. ४५५-४५६मध्ये. उत्तर महाराष्ट्र
आणि दक्षिण गुजरातेत त्यांनी आपला अंमल पुढे सुमारे शंभर वर्षं,
चालुक्यांकडून त्यांना बाधा येईपर्यंत निर्वेध चालवला. त्रिकुट म्हणजे
पुण्याजवळचं जुन्नर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वसाहतकर्म इ. स. ६००मध्ये
पूर्ण झालं.
वसाहत कायम, स्थिर झाली म्हणजे
साहजिकच राजदंडाची आवश्यकता निर्माण होते. महाराष्ट्रावर पहिली सत्ता
मौर्यांची होती. याबद्दल ठोस असा पुरावा शिलालेखांतून मिळतो. सम्राट
अशोकाने आपल्या स्वभावात नैतिक परिवर्तन झाल्याचे लेख आपल्या
साम्राज्याच्या चारही टोकांवर प्रजेचे मन हिंसेपासून वळवण्यासाठी त्या त्या
प्रांताच्या बोलींत खोदवले होते. या लेखांपैकी एक ठाणे जिल्ह्यात सोपारा
इथे, दुसरा महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवर जबलपुराकडे रुपनाथ इथे, तिसरा
आग्नेयीच्या कोपर्यात मस्की इथे आणि चौथा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकास
सिद्धापूर इथे, असे महाराष्ट्राच्या चार सीमांतांवर खोदवले आहेत. यावरून हा
प्रांत अशोकाच्या साम्राज्यात येत असावा. अशोकानंतरच्या बिंदुसार राजाने
जरी आक्रमण केलं नाही तरी पुढच्या चंद्रगुप्त मौर्याची सत्ता महाराष्ट्रावर
होती. मौर्यसत्तेचा व मौर्य घराण्याचा स्मृत्यवशेष मोरे या आडनावात राहिला
आहे. मौर्यांची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२१पासून १८४पर्यंत होती.
#१५ सह्याद्रीतील गुंफा
इ.स. पूर्व पाहिले शतक. शुर्परक
(आजचे सोपारा) आणि कल्याण या दोन व्यापारी बंदरांवर रोम मधून व्यापारी
जहाजे येत असत. रोम मधून आलेल्या वस्तू इथून इतर राज्यांत रवाना होत.
पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना सह्याद्रीच्या पलीकडे असलेल्या देशाशी
जोडणारा मुख्य मार्ग होता नाणेघाट. सह्याद्रीची मोठी पर्वतरांग ओलांडण्या
करिता नाणेघाट हा एक सोपा रस्ता होता. या भागावर ज्याचे राज्य असे, त्याला
व्यापाऱ्यांकडून जकात मिळत असे. या व्यापाराने अनेक राज्ये भरभराटीस आली.
नाणे घाटात एका मोठ्या रांजणात जकात भरून व्यापारी जीर्णनगर (जुन्नर),
निधीनिवास (नेवासा), नाशिक, तगर (तेर) आणि प्रतिष्ठान (पैठणला) या ठिकाणी
जात.
नाणे घाट हा इ.स. पूर्व पहिल्या शतकातील एक
प्रसिद्ध व्यापारी थांबा आणि मार्गही होता. या घाटात असणारी गुहा आजही या
वैभवशाली काळाची साक्ष देते. या गुहेत एक मोठा शिलालेख आहे. त्या मध्ये
नागनिका राणीने व सातवाहन राजाने केलेल्या यज्ञांचा व मोठ्या प्रमाणावर
केलेल्या दानधर्माचा उल्लेख आला आहे. पूर्वी या गुहेत राजाचा, राणीचा
पुतळा देखील होता. आता मात्र तो नष्ट झाला आहे. या राणीने तिचे दोन्ही
पुत्र सज्ञान होईपर्यंत २१ वर्षे अतिशय कुशलतेने राज्यकारभार सांभाळला
होता.
नाणेघाटातील गुहेप्रमाणे भारतात ठिकठिकाणी
अनेक शैलगृहे (rock shelters) आढळतात. या शैलगृहांचा (rock shelters)
प्रवास सुरू होतो तो मौर्य काळात. राजा अशोक आणि त्याचा नातू दशरथ याने
बिहार मधील बाराबर टेकड्यांमध्ये आजीवक पंथासाठी एक गुहा खोदली. लोमेष ऋषी
गुंफा म्हणून ही गुहा ओळखली जाते. अशी शैलगृहे नंतरच्या काळात
सार्थवाहांसाठी (व्यापारी तांडे) विश्रांतीचे ठिकाण बनली आणि त्याच बरोबर
बौद्धधर्म प्रसाराची मुख्य केंद्रही झाली.पूर्वी सार्थवाहांबरोबर (व्यापारी
तांडे) बौद्ध भिक्षूही प्रवास करीत आणि धर्म प्रसाराचे काम करीत.
महाराष्ट्रातील व्यापारी मार्गांवरची ही लेणी या बौद्ध भिक्षूंची
आश्रयस्थाने किंवा वर्षावास (वर्षावास म्हणजे पावसाळ्यामध्ये असणारे
निवासस्थान) असत.
भारतामध्ये साधारणपणे १५००
शैलगृहे (rock shelters) आहेत. आणि यातली जवळपास ९०० ते १००० शैलगृहे
महाराष्ट्रात आहेत. बरीचशी शैलगृहे ही तत्कालीन व्यापारी मार्गांवर दिसून
येतात. महाराष्ट्रातील या शैलगृहाना आधार आहे तो सह्याद्रीचा. अतिशय टणक
आणि अभेद्य अशा बसाल्ट (basalt) या अग्निज खडकापासून (igneous rock) पासून
बनलेला सह्याद्री अजिंक्य आहे. या सह्याद्रीच्या डोंगररांगांनी
शैलगृहांच्या निर्मितीचा पाया रचला.
शैलगृहे
खोदताना कारागिरांसमोर सर्वात मोठे आव्हान असे ते म्हणजे गुहेसाठी योग्य
डोंगर शोधणे आणि गुहेचा आराखडा बनवणे. हा गुहेचा आराखडा बनवताना
कारागिरांना इमारतीच्या बांधकामाचा अनुभव कामास आला. आणि इमारतींमध्ये
असणाऱ्या सगळ्या बारीसारीक तपशिलासह ही शैलगृहे उभी राहू लागली. याचे उत्तम
उदाहरण म्हणजे भाजे लेणी. या लेण्यांमध्ये छताला इमारतीच्या
बांधकामाप्रमाणे लाकडी तुळया लावलेल्या दिसतात. या लाकडी तुळयांचे लाकूड आज
२००० वर्षानंतरही शाबूत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन
लेण्यां मध्ये भाजे लेण्यांचां समावेश आहे.
ही प्राचीन लेणी धार्मिक समरसतेची ग्वाही देतात. वेरूळ येथे असणाऱ्या लेण्यांमध्ये जैन, बौद्ध आणि हिंदू धर्माची लेणी दिसतात.
महाराष्ट्रातील
शैलगृहांची किंवा लेण्यांची निर्मिती वेगवेगळ्या राजवंशाच्या कालखंडात
झाली. इ.स. पूर्व पहिल्या शतकात सातवाहन घराण्याचा संस्थापक असलेल्या सिमुक
राजापासून या घराण्याने ४०० वर्षे राज्य केले. यातल्या अधिकांश कालखंडात
पूर्व आणि पश्चिम समुद्राच्या मध्य भूमीवर यांचे वर्चस्व होते.
महाराष्ट्राच्या इतिहासाची सुरुवात ही सातवाहन घराण्यापसूनच करावी लागते.
या राजांनी करवून घेतलेल्या अनेक गुहा सह्याद्री मध्ये आहेत. राज्ञी
नागनिकेचा नाणेघाटातील शिलालेख त्यांची दैदिप्यमान परंपरा आणि धार्मिक
वृत्तीची साक्ष देतो.
– विनिता हिरेमठ
सिंधूसंस्कृती आणि महाराष्ट्रातल्या आद्य वसाहती
(मध्यंतरी
मुंबईतल्या पुरातत्वदिनानिमित्त माझ्याकडून एक छोटास्सा लेख संबंधित
व्यक्तींनी मागवून घेतला होता. काही कारणांमुळे प्रसिद्ध होऊ शकला नाही असं
त्यांनी कळवलं होतं. आज अचानक आठवलं म्हणून इथे टाकतेय. शब्दमर्यादा
असल्याने संक्षिप्तात लिहिला होता. वेळ मिळाला की अपडेट करेन Happy )
सिंधूसंस्कृती
म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे प्रामुख्याने येतात ती आताच्या पाकिस्तानमधे
उदयाला आलेली आखीवरेखीव नियोजनबद्ध शहरं आणि भरभराटीचा व्यापार. पण
त्यावेळी भारताच्या इतर प्रदेशांमधे, विशेषतः महाराष्ट्रात, काय परिस्थिती
होती? इथल्या लोकसमूहांची जीवनशैली कशी होती? सिंधूसंस्कृतीचे आणि त्यांचे
काही आपसात संबंध होते का? एक ना अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी
पडलेले असतात. त्यातल्याच काही प्रश्नांचा थोडक्यात घेतलेला हा मागोवा...
सुमारे
दहा लाख चौरस किलोमीटर पसरलेल्या नागरी सिंधू संस्कृतीच्या सीमा
पाकिस्तान-इराणच्या सीमेपासून ते गुजरातपर्यंत विस्तारलेल्या होत्या.
आजच्या भारतासारखीच जशी अवाढव्य शहरं होती तशीच छोटी खेडेगावं,
वाड्या-वस्त्या पण होत्या. शहरी व्यापार्यांपासून भटक्या मेंढपाळापर्यंत
सगळ्या प्रकारचे लोक या भूभागात परस्परसान्निध्यात रहात होते.
सिंधूसंस्कृतीच्या नागरी कालखंडात (इ.स.पू. २६०० - २०००) भारतीय उपखंडाच्या
बहुतेक सर्व प्रदेशांमधील लोकसमूह भटक्या शिकारी जीवनाकडून स्थायी शेतकरी
जीवनाकडे वाटचाल करत होते असं दिसतं. यातल्या शेजारपाजारच्या लोकसमूहांशी
सिंधूसंस्कृतीचे देवाणघेवाणीचे संबंध होते याचे पुरातात्त्विक पुरावेही
उपलब्ध आहेत.
दख्खनचं पठार मात्र या सांस्कृतिक
देवाणीघेवाणीच्या मुख्य धारेपासून थोडंसं दूर होतं. महाराष्ट्रात
आदिमानवाचा वावर सुमारे ७ -८ लाख वर्षांपासून होता असे दिसून येते. सुमारे
साडेचार हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शेतीच्या तंत्रज्ञानाचा प्रसार
व्हायला हळुहळू सुरूवात झाली. आपल्या आधी राजस्थान, गुजरात, माळवा या
प्रदेशांमधे शेती करणारा समाज उदयाला आला होता. त्यांच्याकडूनच
उपजीविकेच्या या नव्या तंत्राची ओळख दख्खनच्या पठारावर रहाणार्या
मानवसमूहाला झाली असं दिसतं. सर्वात प्रथम तापीच्या खोर्यात, खानदेशात या
वसाहती उदयाला आल्या असं दिसतं. सुरुवातीची गावं हंगामी होती, जितकी शेतीवर
तितकीच शिकार आणि पशुपालनावर अवलंबून होती. अशी हंगामी गावं लौकरच
कायमस्वरूपी स्थिरावली, शेतीच्या तंत्रातही प्रगती झाली आणी त्यांचे रूपही
पालटले. आजवर महाराष्ट्रात अशी सुमारे दीडशेच्यावर स्थळं उजेडात आली आहेत.
या लोकसमूहांना अजून लोहतंत्रज्ञान अवगत झालेलं नव्हतं. फक्त तांबं आणि दगड
यांचा वापर ते करत असत म्हणून त्यांना ताम्रपाषाणयुगीन संस्कृती असं
म्हणलं जातं.
सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा
करून त्यावर झोपडी बांधून रहात असत. त्यांची मातीची भांडी फारशी पक्की
भाजलेली नसत. लाल रंगावर काळ्या-तपकिरी रंगाची नक्षी किंवा काळ्या रंगावर
लाल नक्षी काढलेली असे. यात विविध प्राणी, पक्षी, शस्त्रास्त्रं अशी
चित्रसंपदा आढळते. मात्र सुमारे इ.स.पू १८०० च्या आसपास या वसाहतींमधे
सांस्कृतिक बदल झालेले दिसायला लागतात. परत एकदा गुजरातमधल्या वसाहती याला
कारणीभूत होत्या.
सुमारे इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची
नागरी व्यवस्थेचा र्हास होण्यास सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय
प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे
नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला लागली आणि सगळा समाज परत एकदा
ग्रामीण संस्कृतीकडे परतला. गुजरातेतल्या सिंधू संस्कृतीच्या वसाहतीही याला
अपवाद नव्हत्या. तिथे आधीपासूनच असलेल्या स्थायी शेतकरी वसाहती आता
पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे अर्धभटक्या पशुपालक झाल्या आणि चराऊ कुरणांच्या
शोधात सोनगढच्या खिंडीतून खानदेशाकडे येऊ लागल्या. आणि त्यांच्याशी
असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून, त्यांच्या इथे झालेल्या स्थलांतरातून
सिंधूसंस्कृतीच्या जीवनशैलीचा प्रभाव खानदेश आणि प्रवरेच्या खोर्यात
असलेल्या लोकसमूहांवर झालेला दिसतो.
आजवर सुमारे २५ उत्तर सिंधू
संस्कृतीच्या वसाहतींची नोंदणी तापीच्या खोर्यात झाली असली तरी त्यांच्या
जीवनशैलीबद्दल विस्ताराने जाणून घेता आलं ते प्रवरेच्या खोर्यातील
दायमाबादच्या उत्खननामुळे. दख्खनच्या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीच्या या
सर्वात मोठ्या वसाहतीत असं दिसून आलं की नागरीकरण लयाला गेलं असलं, तरी
इतक्या शतकांनंतरही घरबांधणीच्या भूमितीत बदल झाला नव्हता. आता भाजक्या
मातीच्या विटा नव्हत्या, तर कच्ची भेंडं वापरून घरं बनवली जात होती. पण
विटांचा आकार मात्र अजूनही ४:२:१ अशाच मापात होता. भिंती अजूनही अचूक
काटकोनात उभारल्या जात होत्या. आणि मृतांची दफनंही आधीच्या पद्धतीने खड्डा
खणून केली जात होती. पूर्वीच्या सुंदर नक्षी असलेल्या मातीच्या मडक्यांऐवजी
आता फार उत्तमरीतीने भाजलेली, सिंधूसंकृतीच्या नागरी कालखंडातल्या
मडक्यांशी साधर्म्य सांगणारी काळ्या रंगाची भौमितिक नक्षी काढलेली लाल
रंगाची मडकी वापरली जाऊ लागली. अर्थात उपजीविकेच्या पद्धतीत मात्र फरक पडला
नाही. आधीप्रमाणेच पशुपालन, शेती आणि शिकार यावर त्यांचं जीवन अवलंबून
होतं. यांचेही गुजरात-राजस्थान-माळवा येथील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींशी
देवाणघेवाणीचे संबंध होते.
तसंच या उत्खननात सिंधूसंस्कृतीची
लिपी कोरलेल्या दोन वर्तुळाकार मातीच्या मुद्रा आणि चार खापराचे तुकडे
मिळाले. ही लिपी अजूनही वाचता न आल्याने त्यावर काय लिहिलंय ते जरी अज्ञात
असलं तरी हा नागरी संस्कृतीचा वारसा इतक्या शतकांनंतर इतक्या दूरवरच्या
प्रदेशात जपला गेल्याचं महत्व कमी होत नाही.
यात सगळ्यात
सनसनाटी, लक्ष वेधून घेणारा शोध ठरला तो म्हणजे या पांढरीच्या टेकाडावर एका
शेतकर्याला मिळालेल्या चार ब्रॉन्झच्या मूर्ती. दोन बैलांचा रथ हाकणारा
माणूस, गेंडा, म्हैस आणि हत्ती. विशेष म्हणजे या सगळ्यांना खाली चाकं आहेत.
अभ्यासकांच्या मते ही खेळणी नसून यांचा संबंध धार्मिक श्रद्धा समजुतींशी
असणार व कदाचित मिरवणुकीसारख्या कुठल्या विधीत यांचा वापर होत असण्याची
शक्यता असावी. जरी या मूर्तींच्या कालनिर्णयाविषयी वाद आहेत, तरीही
बहुसंख्य अभ्यासकांच्या मते या उत्तर सिंधू संस्कृतीशी संबंधितच आहेत.
गुजरातेतून
आलेले हे सांस्कृतिक प्रभाव इथल्या लोकसमूहाच्या जीवनशैलीत मिसळून गेले.
जरी नंतरच्या ताम्रपाषाणयुगीन कालखंडात ही घरबांधणी, लिपी लोप पावलेली
दिसते तरी त्यांचे कर्ते इथल्या लोकसमूहात एकरूप होऊन गेले असणार.
मराठी
असणं, दख्खनी असणं म्हणजे काय यावर भरपूर उहापोह करता येईल. पण एखादी
प्रादेशिक अस्मिता जेव्हा निर्माण होते तेव्हा ती कितीही स्वतंत्र असली तरी
तिच्या आसपासच्या संस्कृतींपेक्षा, प्रादेशिकतेपेक्षा वेगळी, अलिप्त राहू
शकत नाही याचं भान आपल्याला राखलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत गेल्या
चार-साडेचार हजार वर्षांत अनेक लोकसमूह, त्यांचे सांस्कृतिक प्रभाव आले,
इथल्या मातीत मिसळले, रुजले आणि संस्कृतीची नदी वाहती राहिली. आज त्या
सगळ्यांची स्मृती राहिलीच आहे असं नाही, त्यांचे वेगवेगळे रंग सांगता येणार
नाहीत असे मिसळून गेलेत. पण यात सुदूर वायव्य भारतातल्या नागरी सिंधू
संस्कृतीचाही एक प्रवाह कधी काळी येऊन मिळालाय, कुठेतरी एकाच धाग्याने हे
पश्चिम आणि वायव्य भारतातले प्रदेश जोडले गेले होते इतकं आपण सर्वांनी
लक्षात ठेवलं तरी खूप आहे!
हरप्पा व मोहेंजादारो
ते दख्खन पठारचा "सिंधू संस्कृती" चा प्रवास आणि स्थिरता, प्रगती आणि
प्रसार....या मुद्द्यांना धरून हा लेखनप्रपंच असल्याचे दिसत्ये. जर क्रमशः
असेल तर या विषयात गम्य आणि रुची असणार्यांच्या दृष्टीने हे लेखन सुखद
वाचनाचा आनंद निर्माण करून देईल हे नि:संशय.
लेखिका
वरदा यानी सिंधू संस्कृतीच्या र्हासाची कारणे देताना वर असे म्हटले आहे,
"...इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्हास होण्यास
सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी
व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली,..." ~ यातील कारणे मान्य
होण्यासारखी आहेतच पण प्रमुख कारण होते 'आर्यांचे' झालेले सिंधू
संस्कृतीवरील विनाशक असे आक्रमण...त्याचा उल्लेख लेखात होणे गरजेचे आहे.
आर्य {तसेच त्यांच्या आगेमागे येत राहिलेल्या हूण, शक, यवन अशा टोळ्यानीही}
टोळ्यांचे भारतातील - खरे तर हिंदुस्थानातील म्हणायला हवे - आगमन हे एक
निर्घृण प्रकारचेच होते अन् त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे बहराला आलेली
सिंधू संस्कृती हळुहळू लयाला जाऊ लागली.
अर्थात
इतिहास संशोधक असेही मानतात की, आर्यानी 'सिंधू संस्कृतीचा नाश केला असे
म्हणण्याऐवजी त्यानी हरप्पा व मोहेंजोदारो ही नगरे नष्ट केली...'. तरीही या
दोन नगरांमध्ये वसलेली संस्कृती [जी विशेषकरून कृषिप्रधानच होती] त्या
अगोदरच बाहेर दूरवर पसरली होती....उदा. दख्खन पठाराचा वर लेखात उल्लेख
आलेला आहेच....त्यामुळे आर्यांच्या आक्रमणानंतरही सिंधू संस्कृती तग धरून
राहिल्याच्या खुणा होत्याच.
असो... लेखमाला चालू राहिल्यास अजूनही विस्ताराने चर्चा करता येईल असे वाटते.
अशोक पाटील
[अवांतर
: लेखात एके ठिकाणी ... "सुरुवातीच्या या हंगामी गावांमधली लोकं गोल खड्डा
करून त्यावर झोपडी बांधून रहात असत...." असे म्हटले गेले आहे. यातील 'गोल
खड्डा' ऐवजी 'एक वर्तुळ' चे योजन योग्य वाटेल. 'खड्ड्या' ला विशिष्ट अशा
खोलीचा संकेत आहे. त्या संस्कृतीतील लोक कुटुंबाच्या आकारानुसार जमिनीवर
आवश्यक त्या मापाचे वर्तुळ आखत आणि त्यावर झोपडी बांधत. अर्थात त्या
वर्तुळाला दगडविटांची आकृतीबंध जोड दिली की किमान सहा इंच खड्डा भासत असे
हे मान्य....पण मूळ खड्डा संबोधनाची व्याख्या त्या वर्तुळाला लावणे योग्य
ठरणार नाही.]
'आर्यांचे आक्रमण' ही कल्पना अग्राह्य आहे हे अनेक संशोधनांमधून सिध्द झाले आहे.
'आर्यांचे
सिंधूसंस्कृतीवर आक्रमण' ही तर कवी कल्पना आहे. माझ्या माहीतीप्रमाणे
पुरातत्वज्ञ मॉर्टिमर व्हीलर याने प्रथम हराप्पा येथे सापड्लेले सांगाडे हे
'पुरंदर इंद्राने 'नगरे' फोडून तेथील लोकांना मारले' ह्या ऋग्वेदीय
कल्पनेचे पुरातत्वीय वास्तव मानले. हे अर्थातच चूक होते कारण सर्व सांगाडे
वेगवेगळ्या कालखण्डामधील होते.
सिंधूसंस्कृती व ऋग्वेद्/आर्य
यांचा संबंध व अ-संबंध लावणारे विविध पुरावे समोर येत असतात व विश्लेषणे
होत असतात. तरीही आर्यांचे आक्रमण ही मुळात भाषिक साम्यावरून केलेली कल्पना
आहे व सिंधूसंस्कृतीची लिपी अजून आपण वाचु शकत नाही. त्यामुळे तोपर्यंत
निर्णायक पुरावा तयार होउ शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
'आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते' अशा प्रकारचे उल्लेख म्हणूनच योग्य नाहीत असे मला वाटते.
अशोक यांनी त्यांच्या मुद्द्यासाठी कुठल्या पुस्तकाचा/ ग्रंथाचा आधार घेतला आहे हे कळले तर बरे होईल.
वरदा, उत्तम लेख. (अजून विस्ताराने लिही बघू)
मला वरदा हा विषय कसा विस्तृत करून मांड्ते हे वाचायची उत्सुकता आहे.>> +१.
सुमारे
इ.स.पू २००० पासून सिंधुसंस्कृतीची नागरी व्यवस्थेचा र्हास होण्यास
सुरुवात झालेली दिसते. पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी
व्यापार अशा आणि इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली, लेखनकला विस्मृतीत जायला
लागली आणि सगळा समाज परत एकदा ग्रामीण संस्कृतीकडे परतला.>>>
याबद्दल विस्ताराने सांगशील का? हे असं "विकासाकडून भकासाकडे" चाक उलटं
फिरू शकतं का? हा असा एवढा मोठा बदल होऊन यायला साधारण किती काळ जावा लागला
असेल?
पण प्रमुख कारण होते 'आर्यांचे' झालेले
सिंधू संस्कृतीवरील विनाशक असे आक्रमण...त्याचा उल्लेख लेखात होणे गरजेचे
आहे. आर्य {तसेच त्यांच्या आगेमागे येत राहिलेल्या हूण, शक, यवन अशा
टोळ्यानीही} टोळ्यांचे भारतातील - खरे तर हिंदुस्थानातील म्हणायला हवे -
आगमन हे एक निर्घृण प्रकारचेच होते अन् त्याचे दूरगामी परिणाम म्हणजे
बहराला आलेली सिंधू संस्कृती हळुहळू लयाला जाऊ
लागली.>>>>>>अनुमोदन,अशोक पाटील अगदी योग्य मत.
लेखिकेने
जाणूनबुजून उल्लेख टाळला आहे हे स्पष्ट आहे.आर्यांचे आक्रमण हा विषय
दाबण्याचा प्रयत्न हिंदूत्ववादी नेहमीच करत असतात, इथे माबोवरचे अनेकजण
लॉजिकल चर्चा करायची अपेक्षा ठेवतात ,मात्र आर्यवादाच्या चर्चेला सोइस्कर
बगल देतात.परखड मुद्दा मांडल्याबद्दल पाटीलसरांचे आभार.
<'आर्यांचे सिंधूसंस्कृतीवर आक्रमण' ही तर कवी कल्पना आहे.>>
लोकमान्य टीळकांनी त्यांच्या आर्टीक्ट होम इन वेदाज या ग्रंथात अग्निपुजक आर्य थेअरीला दुजोरा दिला आहे, टीळक कवी होते काय? Proud
अशोक -
१.
<<हरप्पा व मोहेंजादारो ते दख्खन पठारचा "सिंधू संस्कृती" चा प्रवास
आणि स्थिरता, प्रगती आणि प्रसार....या मुद्द्यांना धरून हा लेखनप्रपंच
असल्याचे दिसत्ये.>> लेखाचा मुद्दा वेगळा आहे - सुदूर सिंधू
संस्कृतीशी दख्खनच्या पठाराचा, इथल्या वसाहतींचा काही संबंध होता का हा
आहे. यात दख्खनचं पठार व इथल्या आद्य वसाहती सिंधू नागरी संस्कृतीच्या
परिघाबाहेर होत्या हे अनुस्यूतच आहे. शिवाय सिंधू संस्कृतीची स्थिरता,
प्रगती हेही मुद्दे याच्यात अंतर्भूत नाहीत
२.आर्यांचे
सिंधूसंस्कृतीवरील आक्रमण हा आता पुरातत्वासाठी जवळपास मृत झालेला सिद्धांत
आहे. आर्य या शब्दाचा अर्थ अभ्यासक आर्य भाषा बोलणारे असा लावतात. आता
विशिष्ट भाषिक लोक वेगळे असे पुरातत्वीय पुराव्यात ओळखू येणं पुराभिलेख
नसले तर जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे आर्यांचं स्थलांतर (आक्रमण नव्हे) हा
पुरातत्वीय मार्गाने वेध न घेता येणारा प्रश्न आहे. हा हिस्टॉरिकल
लिन्ग्विस्टिक्सच्या अखत्यारीतला प्रश्न आहे हे समस्त व्यावसायिक
पुरातत्वीयांनी मान्य केलेलं आहे. (वरती मनीषाने सुद्धा वेगळ्या शब्दांत
हेच लिहिले आहे) मुळातच इतक्या शेकडो ठिकाणी उत्खनन झाल्यानंतरही कुठेही
युद्धाचा पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे पुरातत्व सिंधूसंस्कृतीच्या
र्हासासाठी कुठलंच युद्धजन्य कारण ग्राह्य धरणार नाही.अनेको दशके
चाललेल्या पुरातत्वीय पुरावे, पुरापर्यावरणीय पुरावे, मेसोपोटेमियातील
तत्कालीन घडामोडी अशा आणि इतर विविध विश्लेषण-संशोधनाने सिंधू संस्कृतीच्या
नागरीकरणाचा र्हास कसा झाला यावर पुरातत्वीयांनी केलेल्या भाष्याचं सार
म्हणजे 'पर्यावरणीय प्रतिकूलता, जवळजवळ ठप्प झालेला परदेशी व्यापार अशा आणि
इतर कारणांमुळे नगरं उजाड झाली,....'
यात माझे
शब्द नीट वाचलेत तर लक्षात येईल की मी कुठेही सिंधू संस्कृतीचा विनाश झाला
असं म्हणत नाहीये तर नागरीकरणाचा र्हास झाला असं म्हणलं आहे. या ग्रामीण
झालेल्याअ उत्तर सिंधू काळातल्या विविध प्रादेशिक संस्कृतींमधूनच लोहयुग
आणी नंतर आद्य ऐतिहासिक काळ उदयाला आला. मानवी वसाहतींच्या इतिहासरेषेमधे
इथे कुठेही खंड पडलेला दिसत नाही
मुळात सुमारे
इ.स.पू १५०० च्या आसपास आर्यभाषिक लोकसमूहांचं अस्तित्व भारतीय उपखंडात
जाणवायला लागतं. ते इथलेच का बाहेरून आले, आधी कुठे होते हे पुरातत्व सांगू
शकत नाही. पण भाषिक पुरावे वायव्य सीमेच्या पल्याड निर्देश करतात हे आम्ही
बहुतांशी पुरातत्वज्ञ मान्य करून पुढचे विश्लेषण करतो.
३.
<<या दोन नगरांमध्ये वसलेली संस्कृती [जी विशेषकरून कृषिप्रधानच
होती] त्या अगोदरच बाहेर दूरवर पसरली होती....उदा. दख्खन
पठाराचा...>> सिंधू कृषिप्रधान संस्कृती नव्हती तर अतिशय कॉम्प्लेक्स
अशी नागरी अर्थव्यवस्था होती आणि त्यात अंतर्गत व लांबपल्ल्याचा व्यापार,
विविध प्रकारच्या कारागिरी वस्तूंचे उत्पादन, शेती, पशुपालन, इ. सर्व
मार्गांचा समावेश होता. त्याचबरोबर उरलेल्या भारतीय उपखंडात त्याकाळी ज्या
ग्रामीण संस्कृती उदयाला आल्या त्यात सिंधू संस्कृतीचा कुठलाही वाटा
नव्हता. या घडामोडी स्वतंत्र पातळीवर झाल्या. दख्खनचे पठार त्यातीलच एक.
४.
शक, हूण, यवन, यांचे कालखंड आणि वरील लेखातील कालखंडात काही हजार वर्षांचं
अंतर आहे. शक, हूण, यवन हेही एकमेकांना समकालीन नव्हेत. यातील हूणांनी
स्वार्या केल्या पण शक स्थलांतर करत करत मध्य आशियातून भारतीय उपखंडात
आले. इथलेच होऊन गेले. उगाचच त्यांना निर्घृण वगैरे म्हणण्यात अर्थ नाही.
यवन म्हणजे साधारणपणे ग्रीक, इंडो ग्रीक. यांनीही कधी आक्रमणं केली नाहीत..
५.
मी जेव्हा गोल खड्डा करून रहात होते असं लिहिलं तेव्हा मी pit dwelling चं
भाषांतर केलं आहे. आणि जमिनीत खड्डा करणं हेच इथे अभिप्रेत आहे. गोल घरं
पण मिळाली आहेत पण ती आणि ही खड्डेवाली घरं वेगळी. अधिक माहितीसाठी तुम्ही
महाराष्ट्राचा आदिम इतिहास या माझ्या मायबोलीवरच्याच लेखातील प्रकाशचित्र
कृपया बघा
@येऊकामी -
ह्युमन जेनोम
प्रोजेक्ट अजून चालू आहे आणि त्यांचे भारताविषयीचे निष्कर्ष पुरातत्वीयांनी
केलेल्या शास्त्रीय कालमापनाशी जुळत नाहीत. लाख वर्षांपूर्वी काही जेनोम्स
भारतात आले असतील पण पूर्ण मानवी समूहच फक्त एक लाख वर्षांपूर्वीचा आहे हे
इतक्या विविध दशकं आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध शास्त्रज्ञगटांनी केलेल्या
अनेको पुरातत्वीय स्थळांच्या कालमापनाशी विसंगत आहे.
अशोक
पाटील नेहेमीच अत्यंत प्रामाणिकपणे प्रतिसाद देतात त्यामुळे त्यांना मी
आवर्जून उत्तरं दिली. पण येऊकामी या आयडीला आर्य-हिंदुत्व या विषयावर
काड्या करून बाफ पेटवायची इच्छा दिसतेय, तेव्हा त्यांनी या विषयासाठी नवा
बाफ उघडावा. माझ्या बाफचा विषय दोन दूरवरच्या संस्कृतींचा परस्परसंबंध हा
आणि हाच आहे. कृपया आर्य वाद दुसरीकडे खेळा.
बाकी सर्वांना धन्यवाद. फार नाही तरी थोडाफार तपशील या लेखात निश्चितच टाकेन, पण जरा दम धरा
वरदा + १०००
आर्य
अनार्य ते कधी आले त्यानी काय केले हा मुद्दा इथे गैर्लागू आहे. सिंधू
संस्कृतीच्या ह्रासासाठी कोणतेही बाहेरचे आक्रमण जबाबदार आहे ह्याचा
कोणताही पुरावा मिळालेला नाही. तेंव्हा आर्यांचे आक्रमण वा मायग्रेशन हा
मुद्दा कृपया इथे आणु नये.
येऊकामी ... वरदा ही
पेश्याने पुरातत्व अभ्यासते. पुरावा जर असे सांगत असता की सिंधू
संस्कृतीच्या ह्रासासाठी बाहेरचे आक्रमक जबाबदार होते व ते आक्रमक अर्य
असल्याच्व्हे पुरावे आहेत तर ते लिहिणे तिने टाळले नसते. काय घडले कसे घडले
व कधी घडले ह्याचे चित्र उलगडण्याचे तिचे काम आहे. सत्य शोधन करताना
राजकारण करणे हे नाही. तेंव्हा तिला हिंदुत्वादी वगैरे नाव ठेवण्याचे कहीही
कारण नाही.
वरदा माझा प्रष्ण असा आहे की
नागरीकरण लयास गेले असे मानले तर इतिहास काळात जी नगर रचना दिसते अगदी
अत्ताअता पर्यंत गावातून देखील जी घरांची बांधणी वा नगर रचना दिसते त्यात
सिंधू संस्कृतिच्या नगर रचनेचे ठसे दिसतातच...
तसेच
देवळांच्या (विशेषतः) दक्षीणे कडिल देवळांच्या रचनेत पुष्करणी, कुंभ हा थे
ग्रेट बाथ चा वशंज दिसतोच जर नागरीकरण लोप पावले असे म्हटले तर हे नंतरचे
ठसे कसे? ह्याचे काय एक्स्प्लेनेशन?
ताम्रपाषाण काल (2000 ई. पू. 500 ई. पू.)
ताम्रपाषाण काल को अंग्रेजी में Chalcolithic Age कहते हैं।
मनुष्य
द्वारा प्रयोग में लाई जाने वाली प्रथम धातु तांबा थी। इस काल में प्रस्तर
तांबा के साथ-साथ निम्न गुणवत्तायुक्त कांसे का भी प्रयोग होता था।
आहार / गिलुन्द / बनास संस्कृति (3000 ई. पू. 1500 ई. पू.)
राजस्थान के दक्षिण-पूर्व में बनास नदी घाटी में बनास संस्कृति का विकास हुआ।
ताम्रपाषाण संस्कृति की मुख्य विशेषताओं को दर्शाने वाले स्थल आहार के नाम पर इसे आहार संस्कृति भी कहा जाता है।
आहार को ताम्रवती कहा गया है, क्योंकि यहां से पत्थर के बजाय ज्यादातर तांबे के ही औजार प्राप्त हुए।
आहार
के उत्तर-पूर्व में स्थित गिलुन्द से भी पत्थरों के नगण्य उपयोग तथा ईंटों
के अधिक प्रयोग के साक्ष्य प्राप्त हुए गिलुन्दर से फलक उद्योग भी प्राप्त
हुए हैं।
एच. डी. संकालिया के द्वारा किए गए उत्खनन में यहां से अग्निकुण्ड का साक्ष्य भी मिला है।
कायथा संस्कृति (2000 ई. पू. 1800 ई. पू.)
1664 ई. में वी. एस. वाकड़कर द्वारा कायथा संस्कृति को प्रकाश में लाया गया।
कायथा
संस्कृति हड़प्पा संस्कृति की कनिष्ठ समकालीन मानी जाती है। यहां के कुछ
मृदभांडों पर प्राक् हड़प्पाई तथा कुछ पर हड़प्पाई प्रभाव दिखाई देता है।
स्वाल्दा संस्कृति (2000 ई. पू. 1800 ई. पू.) -यह संस्कृति ताप्ती नदी घाटी में स्थित थी।
एरण / नवदाटोली / नागदा / मालवा संस्कृति (1700 ई. पू. 1200 ई. पू.) -
मालवा
संस्कृति अपने मृदभांडों (चित्रित काले व लाल मृदभांड) की उत्कंष्टता के
लिए जाने जाते हैं। मालवा संस्कृति के लोग कटाई, बुनाई में भी दक्ष थे।
यहां से चरखे तथा तकलियों के साक्ष्य प्राप्त हुए हैं।
एच. डी.
संकालिया द्वारा उत्खनित नवदाटोली मालवा संस्कृति का सबसे विस्तृत
ताम्रपाषाणकालीन ग्रामीण स्थल है। यहां से सर्वाधिक फसलों की संख्या
प्राप्त हुई है।
जोरवे संस्कृति ( 1400 ई. पू. 700 ई. पू.)
जोरवे
संस्कृति के अन्तर्गत प्रमुख स्थल महाराष्ट्र में गोदावरी व उसकी सहायक
प्रवरा नदी घाटी में स्थित जोरवे, नेवासा, दायमाबाद ईनामगांव, प्रकाश,
चंदोली आदि हैं। इस संस्कृति की सर्वप्रमुख विशेषता पूर्ण शवाधान एवं कलश
शवाधान पद्धति है। यहां घरों के फर्श के नीचे बड़ी संख्या में बच्चों के
शवों के साथ कलश भी दफनाए जाते थे, जिनमें मृतक की आवश्यकता की वस्तुएं रखी
जाती थीं।
यहां मृतक को उत्तर दक्षिण दिशा में दफनाया जाता था।
जबकि उत्तर भारत में आंशिक समाधान पद्धति थी इस संस्कृति के शवाधानों से
प्राप्त अस्थियों के अध्ययन से वयस्कों व शिशुओं में दंतक्षरण तथा शिशुओं
में स्कर्बी रोग का पता चलता है।
जोरवे संस्कृति के अन्तर्गत
ईनामगांव से कृतिम सिंचाई के प्राचीनतम् साक्ष्य प्राप्त होते हैं। यहां से
बस्ती की किले बंदी के भी साक्ष्य प्राप्त होते हैं। यहां केन्द्र में
शासक वर्ग, पश्चिम में शिल्पी व प्राचीर के किनारे शेष लोगों के रहने के
साक्ष्य प्राप्त होते हैं, जिससे सामाजिक दूरी जाहिर होती है।
जोरवे
संस्कृति के अन्तर्गत नेवासा नामक स्थान से पटसन, नैदानिक मृदभांड व
टोटीदार बर्तन के साक्ष्य प्राप्त होते हैं। यहां से रेशम उत्पादन के विश्व
के प्राचीनतम् साक्ष्य प्राप्त हुए हैं।
इस संस्कृति के
अन्तर्गत दायमाबाद नामक स्थान से तांबे का रथ, भैंसा, हाथी व गैंडा के
साक्ष्य तथा गणेश पूजा के साक्ष्य प्राप्त होते हैं। दायमाबाद हड़प्पाकालीन
स्थल भी था। हड़प्पा काल में यहां से कांसे का रथ मिला है, जिसमें दो
बैलों की जोड़ी जुती है और इसे एक नग्न मानव चला रहा है।
पूर्वी भारत स्थित ताम्रपाषाणकालीन स्थल
उत्तर
प्रदेश स्थित खैराडीह व नरहन, बिहार स्थित चिरान्द, सेनुआर, सोनपुर व
ताराडीह, बंगाल स्थित पांडू रजार ढीबी व महीसादल से भी ताम्रपाषाणकालीन
वस्तुएं प्राप्त हुई हैं।
दक्षिण भारत स्थित ताम्रपाषाणकालीन स्थल :
दक्षिण
भारत में ब्रह्मगिरी, मास्की, संगेनकल्लू, पिकलीहल, उतनूर, पोचमपल्ली,
नागार्जुनकोण्ड, कोडक्कल आदि स्थानों से ताम्रपाषाणकालीन संस्कृति के
साक्ष्य प्राप्त होते हैं। इनकी सर्वप्रमुख विशेषता भस्म टीले (Ash Mont)
हैं, जो मवेशी रखने वाली बस्ती के अवशेष हैं। यहां वर्ष के अन्त में मवेशी
के गोबर व बाड़े की लकड़ियों को जला दिया जाता था, जिनसे भस्म टीलों का
निर्माण हो गया था।
लौह युग :
दक्षिण
भारत में ताम्रपाषाणकाल का अन्त व लोह युग का प्रारंभ 1000 ई. पू. में
हुआ। यहां से लाल व काले मृदभांडों के साथ लौह उपकरण भी प्राप्त होते हैं।
लौह उपकरणों में कृषि उपकरणों की अपेक्षा युद्धास्त्रों की संख्या अधिक है।
इस प्रकार उत्तरी भारत के विपरीत दक्षिण भारत में लौह युग पाषाणकाल के
तुरन्त बाद प्रारंभ हो जाता है।
वृहदपाषाणकाल :-
तत्पश्चात्
दक्षिण भारत में महापाषाणकाल / वृहदपाषाणकाल (Megalithic Age) की शुरूआत
हुई महापाषाणकाल की सूचना हमें उनकी यथार्थ बस्तियों से कम तथा उनकी कब्रों
से ज्यादा मिलती है। ये कब्रें रिहायशी इलाकों से बाहर, वृत्ताकार या
चौकोर होती थीं, जिनके ऊपर गोल पत्थर व भीतर आवश्यकता की वस्तुएं रखी जाती
थीं, जिनमें लौह उपरकरण भी होते थे। उदाहरणार्थ अदिचनल्लूर व महुरझारी से
प्राप्त करें। कब्रगाह मुख्यतः दो प्रकार के थे- पिट्टबरीयल (आंशिक शवाधान)
एवं शिष्टबरीयल (पूर्ण शवाधान)
ताम्र निधान संस्कृति
ताम्र
संचय का सबसे प्रथम साक्ष्य 1822 ई. में कानपुर (उत्तर प्रदेश) के पास
बिदुर से ताम्र मत्स्य भाले के रूप में प्राप्त हुआ है। परन्तु ताम्र संचय
का सबसे बड़ा भण्डार (424 ताम्र उपकरण) मध्य प्रदेश के गंगेरिया नामक स्थान
से प्राप्त हुआ है। अब तक ताम्र संचय के कुल 85 स्थान प्रकाश में आए हैं,
जिनमें सर्वाधिक स्थल उत्तर प्रदेश से प्राप्त हुए हैं। इटावा (उत्तर
प्रदेश) के पास साईपाई नामक स्थान से ताम्र संचय के साथ गरिक मृदभांड भी
प्राप्त हुए हैं। इस आधार पर ताम्र संचय का संबंध गैरिक मृदभांड से मान
लिया गया।
गैरिक मृदभांड संस्कृति (2000 ई. पू. 1500 ई. पू.) :
इस
संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य उत्तर प्रदेश स्थित बदायूं के पास रिसौली
और बिजनौर के पास राजपुरपरशु से प्राप्त हुआ है। इस संस्कृति से जुड़े
सर्वाधिक स्थल गंगा-यमुना दोआब में स्थित आलमगीरपुर, हस्तिनापुर,
अहिच्छत्र, अतरंजीखेड़ा, साईपई नामक स्थान से पाए गए हैं। इस संस्कृति का
नामकरण हस्तिनापुर से प्राप्त मृदभांडों के आधार पर किया गया है। यह
संस्कृति तांबे के प्रयोग से संबंधित थी।
काले व लाल मृदभांड संस्कृति (2400 ई. पू. 100 ई.) :
इस
संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य उत्तर प्रदेश स्थित अतरंजीखेड़ा नामक स्थान
से प्राप्त हुआ है। तत्पश्चात् जोधपुर एवं नोह से भी इस संस्कृति के
साक्ष्य प्राप्त हुए हैं। काले व लाल मृदभांड उत्तर में रोपण से लेकर
दक्षिण में आदिचनाल्लूर तथा पश्चिम में लाखववाल से लेकर पूर्व में पांडु
राजार ढीवी तक प्राप्त हुए हैं। इस मृदभांड का भीतरी व बाहरी किनारा काले
रंग तथा शेष मृदभांड लाल रंग से चित्रित होता था।
चित्रित धूसर मृदभांड संस्कृति
इस
संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य उत्तर प्रदेश स्थित अहिच्छत्र नामक स्थान
से प्राप्त हुआ है, जबकि सबसे बड़ा स्थल हरियाणा के पास बुखारी है। यह
मृदभांड लोहे के प्रयोग से संबंधित था। इस संस्कृति से संबंधित गंगा-यमुना
दोआब से प्राप्त स्थलों से लोहे के उपकरण प्राप्त हुए हैं, परन्तु
हस्तिनापुर से लोहे के उपकरण का साक्ष्य प्राप्त नहीं होता है। हस्तिनापुर
से चावल तथा अतररंजीखेड़ा से गेहूं व जौ के साक्ष्य प्राप्त हुए हैं। इसके
अलावा इस संस्कृति से संबंधित अन्य किसी स्थान से अनाज के साक्ष्य नहीं
मिलते हैं। कृषि उपकरणों में जखेरा से लोहे की बनी हंसिया व कुदाली प्राप्त
हुई है। भगवानपुरा, दधेरी, नागर व कटपालन से भी इस संस्कृति के साक्ष्य
प्राप्त होते हैं, परन्तु यहां से लोहे के उपकरण प्राप्त नहीं होते हैं।
अतः इन्हें परवर्ती हड़प्पा संस्कृति का विस्तार माना जाता है।
उत्तरी काले पॉलिशदार मृदभांड संस्कृति :
इस
संस्कृति का सर्वप्रथम साक्ष्य तक्षशिला नामक स्थान से प्राप्त होता है,
जो मोर्यकालीन है। उत्तर प्रदेश व बिहार से भी इस संस्कृति के साक्ष्य
प्राप्त होते हैं। यह संस्कृति आवश्यक रूप से लोहे से संबंधित थी। कालांतर
में द्वितीय नगरीकरण, पक्की ईंटों व आहत मुद्रा से संलग्न हो गई
वाळवा तालुक्याला चार हजार वर्षांचा वारसा!
अशी बातमी दिनांक १०मे २०१५ रोजी सकाळ मध्ये प्रकाशित झाली आहे. माझा जन्म
वाळवा तालुक्यातील 'बहे' या गावी झाला असल्याने व माझे बालपण उरुण -
इस्लामपूर येथे गेले असल्याने सदर बातमी मी थोडी उत्सुकतेने वाचली . माझ्या
जन्म गावाबाबत एकूण दोन दंत कथा प्रसिद्ध आहेत .
बहे या गावी इस्लामपूर येथून जाण्याचा जो मार्ग आहे त्यावर बहे हे गाव
येण्यापूर्वी अगोदर एक टेकडी लागते. त्या टेकडीस 'तुकाई' ची टेकडी असे
म्हणतात .
प्रभू रामचंद्र जेंव्हा वनवासात दंडकारण्यात प्रवास करीत होते तेंव्हा राम
आता आपल्याला विसरला तर नाही ना ! अशी शंका रामाच्या मातेच्या मनात आली.
त्या शंकेचे निरसन करण्यासाठी तिने रामाची परीक्षा घेण्याचे ठरवले. मग या
टेकडी वर येवून ती तेथे सीतेचे रूप घेवून बसली. अर्थात प्रभू रामचंद्र
यांनी आपली माता ओळखण्यात कसलीच चूक केली नाही. आणि सीतेच्या रूपातील मातेस
त्यांनी विचारले , तू का आई येथे ? आणि या प्रश्नामुळे सदर टेकडी हि तू
का आई = तुकाई म्हणून ओळखली जावू लागली .
त्यानंतर पुढे थोड्या अंतरावर कृष्णा नदी आहे. त्या नदीत एक नैसर्गिक बेट
तयार झाले आहे. त्या बेटावर एक राम मंदिर आहे. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे
रामाचा परम भक्त हनुमान हा रामाच्या समोर एक गुढगा टेकून व दोन हात जोडून
असा बसेलेला नाही तर रामाच्या पाठीमागे उभा आहे. तसेच या ठिकाणी हनुमान
रामाच्या मागे उभा राहताना त्याचे दोन्ही बाहू सरळ आणि तळवे पाठीमागे असा
तो उभा आहे.
या बाबत जी कथा आहे ती अशी कि , कृष्णा नदीतील या रमणीय परिसरात श्रीराम
जेंव्हा ध्यानस्थ बसले होते तेंव्हा अचानक जोरदार पाऊस सुरु झाला. नदीने
रौद्र रूप धारण केले . पाणी वाढत वाढत रामचंद्र जिथे बसले होते त्याच्या वर
येवू लागले. ते पाहून हनुमान प्रभू रामचंद्र यांच्या पाठीमागे गेला आणि
आपल्या दोन्ही बाहूंनी नदीस आडवले. त्यामुळे प्रभू रामचंद्र यांच्या
ध्यानात बाधा आली नाही.
पण नदीची वाट अडल्याने नदीच्या पात्रात पाणी इतके वाढले कि मागे आठ मैल
लांबीचा डोह तयार झाला. शेवटी नदीने हनुमानास पुढे वाट देण्याची विनंती
केली. तेंव्हा हनुमानाने प्रभू रामचंद्र यांच्या ध्यानात अडथळा न आणण्याचा
अटीवर नदीस दोन्ही बाजूनी वाट करून दिली . तर रामचंद्र यांच्या ध्यानात
बाधा येवू नये म्हणून आपल्या बाहूंनी जे बेट तयार केले ते बाहे म्हणजेच बहे
होय.
आता या दोन दंत कथा या खऱ्या कि आख्यायिका हा वाद बाजूला ठेवला तरी तो परिसर मानवी वस्तीच्या खूप जुन्या खुणा आजही जपत आहे. आणि …
आपल्या मायबोली वरील संशोधनक्षेत्रातील मायबोलीकर या विभागात कार्यरत
असलेल्या वरदा यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या संशोधन कार्याची माहिती देणारी
बातमी दिनांक ९ मे २०१५ रोजी सकाळ मध्ये प्रकाशित झाली आहे. त्या
बातमीतून अगदी त्या गावातील नाही पण त्या तालुक्यातील पूर्व वस्तीच्या खुणा
आणि वरदा आणि त्यांच्या गटाने घेतलेल्या अथक परिश्रमाची माहिती त्यातून
मिळत आहे. तर या साठी वरदा यांचे मनपूर्वक अभिनंदन. आपला हा संशोधनाचा अनुभव त्यांनी मायबोलीकरांच्या साठी जरूर सविस्तर प्रकाशित करावा अशी त्यांना खास विनंती आहे.
सोबत बातमी -
पुण्याच्या संशोधकांचे सर्वेक्षण; गावांत ताम्रपाषाणयुगीन खापरे
मुंबई - सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पुरातत्त्वीय संशोधनामुळे
या प्रदेशाचा इतिहास सुमारे चार हजार वर्षे जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्याच्या वरदा खळदकर, मंजिरी भालेराव, अंबरीश खरे, आनंद कानिटकर व
कल्पना रायरीकर या संशोधकांनी चिकुर्डे व आसपासच्या परिसरात पुरातत्त्वीय
सर्वेक्षण करून हे निष्कर्ष काढले आहेत.
वारणा- मोरणेच्या संगमाजवळील चिकुर्डे हे स्थळ 1907 मध्ये इतिहासाचार्य
राजवाडे यांनी वाचन केलेल्या चिकुर्डे ताम्रपटामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे.
ताम्रपटातील स्थळवर्णने व इतर बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे
सर्वेक्षण करण्यात आले. चिकुर्डे, देवर्डे, ऐतवडे बुद्रुक, ऐतवडे खुर्द,
थानापुडे, मांगले व करंजवडे या गावांचा यात समावेश होता. या अभ्यासाअंती
असे लक्षात आले, की या सर्व गावांचा इतिहास सातवाहन काळापर्यंत म्हणजे दोन
हजार वर्षे मागे जातोच; परंतु चिकुर्डे, देवर्डे व मांगले या गावांचा
इतिहास त्याही आधी म्हणजे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीपर्यंत मागे जातो. या
तीनही गावांमधून डेक्कन चाल्कोलिथिक म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळातील खापरे
मिळाली आहेत.
मांगले येथील पुरावा डेक्कन चाल्कोलिथिकच्या सुरवातीच्या काळातील, माळवा
कालखंडातील आहे. असाच पुरावा पूर्वी कऱ्हाड येथील भारत इतिहास संशोधन
मंडळाने केलेल्या उत्खननातही नोंदवला गेला होता. मात्र, चिकुर्डे व देवर्डे
येथील खापरे उत्तरजोर्वे कालखंडाची म्हणजेच ताम्रपाषाणयुगीन काळाच्या
शेवटच्या कालखंडातील आहेत.
महाराष्ट्रातील सर्वांत आद्य शेतकऱ्यांच्या वसाहती सुमारे चार हजार
वर्षांपूर्वी उदयाला आल्या. फक्त तांबे हा धातू माहीत असलेली आणि शेती,
पशुपालन, शिकार यावर अवलंबून असणारी छोटी गावे खानदेश ते कर्नाटक
सीमेपर्यंत सर्वत्र आढळतात. तांबड्या गेरू रंगावर काळी नक्षी असलेली किंवा
काळी-लाल/करडी अशी दुरंगी मातीची भांडी हे लोक वापरत असत. त्या काळी
लेखनकला अस्तित्वात नसल्याने केवळ त्यांनी वापरलेल्या मातीच्या मडक्यांचे
तुकडे हाच त्यांच्या वसाहतींचा एकमेव पुरावा असतो. सुमारे तीन हजार
वर्षांपूर्वी ही गावे अचानक उजाड झालेली आढळतात. प्रतिकूल पर्यावरण आणि
वारंवार पडणारे दुष्काळ हे यामागचे कारण असावे, असे मानले जाते. भीमेच्या
खोऱ्यातील इनामगाव या एकमेव उत्खननातून मिळालेल्या माहितीशिवाय उत्तरजोर्वे
या ताम्रपाषाणयुगीन अंतकाळाविषयी फारशी काहीच ठोस माहिती नाही.
वैशिष्ट्यपूर्ण मडकी वापरणाऱ्या उत्तरजोर्वे काळातील गावांचा पुरावाही भीमा
खोऱ्याबाहेर आजवर अद्याप मिळाला नव्हता.
मात्र, आता अतिशय सुपीक आणि उत्तम पाऊस असणाऱ्या कृष्णेच्या खोऱ्यातही
अशा खापरांचा पुरावा मिळाल्याने या वसाहती केवळ अर्धदुष्काळी भीमेच्या
खोऱ्यापुरत्या मर्यादित नव्हत्या; तर इतर प्रदेशांतही ताम्रपाषाण युगातल्या
शेवटच्या कालखंडात या वसाहती होत्या, हे दिसून आले आहे. त्यामुळे या
कालखंडाचा परत साकल्याने फेरविचार करण्याची गरज आहे, तसेच महाराष्ट्रातील
इतर प्रदेशांतही सर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे, हे या संशोधनातून
अधोरेखित झाले आहे.
या सर्वेक्षणामध्ये अभिजित नाईक (शिराळा) व शहाजी पाटील (चिकुर्डे) आणि कुटुंबीय यांची बहुमोल मदत झाली.
चिकुर्डे, देवर्डे व मांगले येथील पुरातत्त्वीय अवशेष म्हणजे
महाराष्ट्राच्या इतिहासाला एक नवे वळण देणारा अतिशय महत्त्वाचा पुरावा आहे.
तसेच, ही तीनही गावे तीन ते चार हजार वर्षांपासून अस्तित्वात असून, या
प्रदेशातील ती सर्वांत जुनी गावे आहेत.
- वरदा खळदकर, संशोधक
खापरे/ मातीच्या मडक्यांचे तुकडे हे प्रत्येक काळी प्रत्येक प्रदेशात
वेगवेगळे असतात. त्यांचा पोत, रंग, भाजणी यात फरक असतो. एकासारखी खापरे परत
तश्शीच दुसरीकडे, आधी/नंतर बनत नाहीत. त्यामुळे ती प्रत्येक कालखंडाची,
प्रदेशाची, संस्कृतीची निर्देशक ठरतात. गेल्या शंभरपेक्षाही जास्त वर्षे
भारतात उत्खनने झालेली असल्याने कुठल्या प्रदेशात कुठल्या काळात कायकाय
प्रकारची खापरे मिळतात याचे सखोल ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे
खापरे बघून तिथल्यातिथे साधारण कालनिर्णय करता येतो. फक्त त्यासाठी
खापरांचे सखोल ज्ञान हवे. ही खापरे सहसा इतकी पक्की भाजलेली असतात की
साहजिकच मातीत खराब होत नाहीत किंवा 'डिसइन्टिग्रेट' होत नाहीत.
\
https://www.maayboli.com/node/53877
चिकुर्डे: ताम्रपट ते ताम्रपाषाणयुगापर्यंतचा एक प्रवास!
उपोद्घात
या शोधयात्रेच्या कहाणीची खरी सुरुवात झाली ती १९०६ च्या जुलै महिन्यात.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे त्यांच्या अस्सल कागदपत्रे जमवायच्या मोहिमेत
मजल दरमजल करत पोचले ते कोल्हापूरच्या उत्तरेला ४ मैलांवर असलेल्या एका
छोट्याश्या गावंढ्या खेड्यात. त्याचं नाव होतं चिकुर्डे. कृष्णेच्या
खोर्यात वारणा-मोरणेच्या संगमापासून जवळ असलेले हे गाव. त्या गावात
धनगरांची मोठी वस्ती आजही आहे. त्यातल्या गावडे कुळातील एका बाईकडे असलेला
ताम्रपट राजवाड्यांना पहायला मिळाला. त्यावेळेस त्याचा ठसा घेणे त्यांना
शक्य झाले नाही, परंतु त्याचे वाचन करून तपशीलवार नोंद मात्र त्यांनी करून
ठेवली व लगेचच १९०७ मध्ये विश्ववृत्त मधे या ताम्रपटाचे सटीक वाचन प्रकाशित
केले.
हा ताम्रपट कुण्या एका मन्नेय राम गावुंड या माहुताला जनमेजय चक्रवर्तिन
नामक राजाने दिलेले गावांचे दान व मूलस्थानदेव नामक देवतेला दिलेली दाने
नोंदवतो. भावसंवत्सरातील वैशाख महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला हे दान
दिले असा उल्लेख आहे. मात्र शकसंवताचा किंवा इतर कुठल्याच कालगणनेचा त्यात
उल्लेख नाही.
ताम्रपटाला एकुणात तीन पत्रे होते व एका कडीने ते बांधलेले होते. त्या
कडीवर एका चौकोनी मुद्रेवर वराहाचे चिन्ह अंकित होते. वराह हे चालुक्यांचे
राजचिन्ह. त्यावरून राजवाडेंनी अनेगुंदीवरून राज्यकारभार करणारा हा जनमेजय
राजा चालुक्य वंशातील असावा असे अनुमान काढले. मात्र या ताम्रपटाचा काळ
त्यांनी शके ६५८ (इ.स. ७३६) ठरवून मराठी भाषा इतकी मागे जाते असे प्रतिपादन
केले.
याचे परिणाम काय? तर हा ताम्रपट वादाच्या भोवर्यात सापडला. आधीच
ताम्रपटाची कुठलीही 'प्रथमदर्शी प्रत' (eye-copy) नाही आणि त्यात
राजवाड्यांसारख्या थोर विद्वानालाही अधूनमधून सबळ पुराव्याअभावी अतिरंजित
निष्कर्ष काढायची सवय. त्यामुळे हा ताम्रपट 'तोतया (fake/forged)' आहे अशी
त्यावर टीका झाली. गुणे, मार्शल, तुळपुळे यासारख्या भाषातज्ज्ञांनी ही भाषा
आठव्या शतकातील नसून किमान ज्ञानेश्वरकालीन (१३व्या शतकातील) आहे , तसेच
ही भाषा संपूर्णपणे मराठी नसून त्यात अनेक कानडी शब्द, प्रत्यय इ. आहेत असे
ठाम प्रतिपादन केले, या सगळ्या भाषा-काल-निर्णयाच्या लठ्ठालठ्ठीत
इतिहासाच्या दृष्टीकोनातून हा ताम्रपट काहीसा विस्मरणात गेल्यासारखा झाला.
अनेको ताम्रपटांपैकी एक एवढीच त्याची फुटकळ स्वरूपातील नोंद नंतरच्या
अभ्यासकांनी घेतली. समग्र राजवाडे साहित्याच्या एका खंडात त्या लेखाचे
पुनर्मुद्रण झाले असले तरी त्यापल्याड त्याचे किती वाचन झाले असेल ही शंकाच
आहे.
प्रारंभ
२०११ साली हातात थोडा रिकामा वेळ म्हणून ग्रंथालयात नेहेमीच्या कामाची
सोडून इतर पुस्तके चाळताना सहज राजवाडे साहित्याचा हा खंड समोर दिसला.
त्यात माझ्या संशोधनप्रदेशाशी संबंधित म्हणजे पंढरपूर, मंगळवेढा व माढा
येथील लेखांचे वाचन होते म्हणून घेऊन आले. आणि मग सगळेच लेख वाचावेत म्हणून
बसले. चिकुर्डे ताम्रपटाचे वाचन सुरू केले आणि अवाक, आश्चर्यचकित होऊन
अथपासून इतिपर्यंत वाचून काढले. कारण त्यातील स्थळवर्णन. सहसा ताम्रपटांमधे
दान दिलेल्या गावाच्या, जमिनीच्या चतु:सीमा नमूद केलेल्या असतात.
सुरुवातीला देवतास्तुती, राजाची प्रशस्ती, दानाचे स्थळकाळ-दाता-दान दिलेली
व्यक्ती या सगळ्याचे तपशील, दानाचे वर्णन आणि शेवटी हे दान अमान्य
करणार्याला उद्देशून शापवचन असा एक ठराविक साचा असतो. या चतु:सीमा म्हणजे
कुठल्या दिशेला कुठलं गाव अथवा नदी आहे अशाच प्रकारचे तपशील सहसा असतात.
मात्र चिकुर्डे ताम्रपट या बाबतीत फार वेगळा आहे. या चतु:सीमा नमूद करताना,
फक्त आसपासची गावें, नदी, नाले, टेकड्या एवढेच वर्णन न देता, कुठे देवीचं
ठाण आहे, कुठे शंकराचं ठाण आहे, कुठे वीरगळ आहे, कुठे विहिरी आहेत,
सर्पमुखे कोरलेल्या शिळा आहेत, कुठे दगडांचे ढीग आहेत तर कुठे शेणाचे ढीग
आहेत असे बारीकसारीक तपशील इथे नोंदवलेले मला दिसले. आणि सगळ्यात लक्ष
वेधून घेतलं ते एका 'धूळ-मातीच्या' ढिगार्यावर असलेल्या शर-परशु अंकित केलेल्या शिळा आहेत या वर्णनाने. नेहेमीच्या डोंगरापेक्षा वेगळे असे हे टेकाडासारखे ढिगारे म्हणजे पांढरीचे टेकाड असावे हे माझ्या लक्षात आले.
माझ्या संशोधनातल्या भटकंतीत अशा टेकाडांवर अनघड किंवा घडीव शिळा किंवा तशा
शिळेने/ शिळांनी बनलेले लक्ष्मी किंवा मारुती किंवा मरीआई किंवा अशाच
एखाद्या देवतेचे ठाण असते हे मी अनेको ठिकाणी बघितलं होतंच. शिवाय
औरंगजेबाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला तेव्हा त्यावर एक शिळा/चिरा
बसवला होता असा उल्लेखही वाचनात आला होता. तेव्हा हे असे दगड म्हणजे उजाड
वस्तीचे/पांढरीचे निदर्शक (mound markers) असतात असा माझा निष्कर्ष
होता/आहे. आजवर पुरातत्वशास्त्रज्ञांनी या अशा निदर्शकांकडे फारसे लक्ष
दिले नाहीये किंवा नोंदही केली नाहीये, पण मी मात्र जिथे जमेल तिथे याची
नोंदणी तपशीलवार करते आहे, केली आहे.
तर मूळ मुद्दा चिकुर्डे ताम्रपटातल्या वर्णनाचा. इतके बारकाईने
स्थळपरिसराचे वर्णन करणारा, संभवत: पांढरीच्या टेकाडाचे उल्लेख करणारा असा
हा लेख दख्खनच्या इतिहासात अभूतपूर्व आहे हे माझ्या प्रकर्षाने लक्षात आले.
आणि या लेखाचा नव्याने अभ्यास करायच्या मागे मी लागले.
ताम्रपट, शिलालेख यांचा अभ्यास हा माझा खरंतर खास विषय नव्हे. प्राचीन
वसाहतींचे इतिहास तपासताना शिलालेख, ताम्रपट अशा साधनांच्या नोंदींचा वापर
करण्यापुरतेच त्याविषयींचे माझे काम आजवर मर्यादित होते. जुने लेख
अभ्यासायचे तर संस्कृत, प्राकृत भाषा पक्क्या यायला हव्यात. शिवाय विविध
काळांमधली ब्राह्मी, नागरी, देवनागरी अशा लिपींवर प्रभुत्व असणे गरजेचे
असते. मला अगदी कामापुरतं संस्कृत-प्राकृत येतं, ढोबळमानाने लिपी वाचता
येतात. दख्खनमधे असा अभ्यास करताना थोडंफार हाळ-कन्नड (जुनी कानडी) माहित
असणेही आवश्यक असते. तीही मला ओ का ठो येत नाही. तेव्हा मी कधी या विषयात
फार रसही घेतला नव्हता. पण एकूण आजवरचे संशोधन बघता एक स्पष्टपणे जाणवले की
ताम्रपट असो वा शिलालेख, दख्खनमधे त्यांचा इतिहास-साधने म्हणून मर्यादित
स्वरूपात वापर केला गेला आहे. राजे-राजघराणी-वंशावळ्या-राजकीय घडामोडी,
राज्यातले प्रशासकीय विभाग व त्यांचे तपशील, गावांची नावे, आर्थिक तपशील,
सामाजिक गटांची ढोबळ माहिती व काही धार्मिक संदर्भ असतील तर त्यांचे तपशील
एवढ्याच पुरता हा वापर मर्यादित आहे. दख्खनच्या पुरातत्वशास्त्रात जुन्या
लेखांचा वापर करून वसाहतींचे इतिहास तपासणे,त्यांचे प्रादेशिक कालानुक्रम व
निश्चित करून त्याची कारणे तपासणे, इ, प्रयत्नही क्वचितच झालेत, नाहीच
जवळजवळ. चिकुर्डे ताम्रपट मला एक पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून खुणावत होता.
आणि अभ्यास करायचा तर तिथे प्रत्यक्ष जाऊन लेखात लिहिलेल्या स्थळवर्णनाशी
काही तपशील जुळताहेत का, खरंच ते पांढरीचं टेकाड आजही सापडण्यासारखं आहे
का, यात मला रस होता.
खरंतर एवढंच एक उद्दिष्ट सुरुवातीला समोर ठेवून मी आणि माझ्या काही
मित्र-मैत्रीण संशोधकांनी एक फील्डवर्क केलं. त्याची ही पाचा प्रश्नांची
कहाणी.....
स्थळनिश्चिती
पुराभिलेखावर आधारित सर्वेक्षणात सगळ्यात पहिल्यांदा जरूरीचे असते ते
म्हणजे ताम्रपटात उल्लेखल्या गेलेल्या स्थळांची ओळख पटवून निश्चिती करणे
(Place-name identification). या ताम्रपटामध्ये चिकलवाड, देवुलग्राम,
स्ताणपग्राम, आयितग्राम व आमलकग्राम अशी गावांची नावे, वारुवेण्णा नदी,
भैरवपाद, रुद्रपाद, भगवतीपाद अशी देवतास्थानांची नावे आदि माहिती आहे. या
अशा लेखांमधे येणारी संस्कृत ग्रामनामे ही मुळातल्या देशी नावांचे
'संस्कृतीकरण' करून दिलेली असतात असे तज्ज्ञांचे मत आहे (उदा. इ.स. आठव्या
शतकातील एका ताम्रपटात दापोडीचे नाव दर्पपुडिका म्हणून येते)
एकुणात राष्ट्रकूट काळापासूनचे जुने शिलालेख व ताम्रपट बघता असे दिसून येते
की दख्खनमध्ये (आणि भारतातल्या बर्याचशा प्रदेशांत) गावांच्या नावांमधे
फारसा फरक झालेला नाही. नामसाधर्म्यावरून गावे बहुतांशी वेळा विनासायास
ओळखता येतात. मात्र दुर्दैवाने महाराष्ट्रात अनेको लेखांमधील स्थळांची
निश्चिती ही सेन्सस रेकॉर्ड्स किंवा गॅझेट बघून केली गेली आहे. आता जिथे
तपशीलवार टोपोग्राफिक सर्व्हे मॅप्स बघून स्थळनिश्चिती करायची मारामार तिथे
प्रत्यक्ष जाऊन, सर्वेक्षण करून स्थळनिश्चिती पक्की करणे ही फारच दुर्मिळ
गोष्ट!
चिकुर्डेच्या बाबतीत मात्र याला एक अपवाद आहे. इतिहासाचार्य राजवाडेंचाच.
त्यांनी लिहून ठेवले आहे की ऐन पावसाळ्यात हा ताम्रपट वाचल्यामुळे त्यांना
आसपासच्या गावांमधून हिंडून स्थळनिश्चिती करता आली नाही. त्यांनी फक्त
चिकलवाड = चिकुर्डे आणि आयितग्राम = ऐतवडे एवढीच निश्चिती नमूद करून ठेवली
आहे.
इतिहासलेखनामध्ये चिकुर्डे ताम्रपट फारसा महत्वाच न गणला गेल्यामुळे
नंतरच्या अभ्यासकांनीही या स्थळनिश्चितीबद्दल आणखी काही काम केले नाही. डॉ.
ठोसर यांनी आमलकग्राम = अळवली (ता.खानापूर, जि. सांगली) व स्ताणपग्राम =
ठाणेगाव (ता, पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी दोन जागांची ओळख पटवायचा प्रयत्न
केला. मात्र चिकुर्डेच्या आसपासची ही 'सीमेवर' असलेली गावे आहेत हा निकष
त्यांनी न पाळताच ही निश्चिती केल्याने त्याला फारसा अर्थ नाही.
तेव्हा नकाशे हातात घेऊन परत एकदा स्थळनिश्चिती करण्यासाठी ठिय्या मारला.
चिकुर्डेच्या आसपास असलेली गावे व ताम्रपटात दिलेल्या दिशांची पडताळणी करून
पुढीलप्रमाणे संभाव्य स्थळनिश्चिती केली. चिकलवाड = चिकुर्डे, देवुलग्राम
= देवर्डे, स्ताणपग्राम = थानापुडे, आमलकग्राम = मांगले, आयितग्राम =
ऐतवडे बुद्रुक, चिकलग्राम = मांगलेच्या उत्तरेस असलेली चिखलवाडी व
वारुवेण्णा म्हणजे या गावांच्या दक्षिणेला असलेली वारणा नदी. ऐतवडे बुद्रुक
आणि खुर्द अशी दोन गावे आहेत परंतु ताम्रपटात दिलेल्या दिशांना प्रमाण
मानता ऐतवडे बुद्रुक हे आयितग्राम असावे अशी संभावना जास्त आहे.
सर्वेक्षण
यातील चिकुर्डे, देवर्डे, मांगले, ऐतवडे बुद्रुक (हे कर्मवीर भाऊराव पाटील
यांचं गाव), ऐतवडे खुर्द, थानापुडे आणि या सगळ्या परिसराचाच भाग असणारे
करंजवडे (याचा उल्लेख ताम्रपटात नाही) या सात गावांमध्ये व आसपासच्या
परिसरामध्ये एक छोटेसे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. तेथील पांढरीची
टेकाडे, खापरे, शिल्पे, वीरगळ, सतीशिळा, सर्पशिळा, मंदिरे इत्यादी सर्व
प्रकारच्या पुरावशेषांची खानेसुमारी करून या गावांचे सांस्कृतिक
कालानुक्रम, त्यांच्या वसाहतींची प्राचीनता निश्चित करण्यात आली. या
कालानुक्रमांचा थोडक्यात तपशील पुढील प्रमाणे
चिकुर्डे: ताम्रपाषाणयुग - सातवाहन काळ - यादव काळ - मध्ययुग - अर्वाचीन/ सद्यकाळ (अंदाजे इ.स. पू. ३००० ते आजपर्यंत)
देवर्डे: वरीलप्रमाणेच
मांगले: वरीलप्रमाणेच
थानापुडे: सातवाहन काळ ते आजपर्यंत (सुमारे इ,स. पहिले शतक ते आजपर्यंत)
ऐतवडे बु|| : वरीलप्रमाणेच
ऐतवडे खु|| : वरीलप्रमाणेच
या सहाही गावांमध्ये पांढरी सध्याच्या गावाखालीच आहेत. मात्र करंजवडे गावात
अशी पांढर नाही. त्याच्या हद्दीतल्या शिवारांमधे एका महालक्ष्मीच्या
देवळाजवळ, ओढ्यापल्याड, पूर्वी एक पांढर होती अशी माहिती मिळाली. तिथे भेट
दिली असता आज तिथे कसलेच अवशेष नाहीत परंतु देवळाशेजारच्या शेतात
सातवाहनकालीन एक खापर मिळाले. ही 'महालक्ष्मी'ची मूर्ती १५-१६व्या शतकातील
शैव मूर्ती असून तिला साडीचोळीने व मुखवट्याने सजवण्यात आलेले आहे.
(चिकुर्डे येथील पांढरीची तपासणी करताना)
याशिवाय चिकुर्डेच्या हद्दीतच पण गावठाणाबाहेर वायव्येला धनगरांचे दैवत
विठ्ठल-बीरदेव / विठोबा-बिरोबा यांचे एक मोठे मध्ययुगीन मंदिर आहे. इथला
विठोबा मात्र पंढरीच्या विठुरायासारखा वैष्णवरूप धारण करून 'विटेवरी उभा'
नाही तर चक्क त्याच्या आदिम धनगरी अनघड तांदळा स्वरूपात आहे. हा विठोबा
तिथे कोल्हापूरजवळच्या कोडोली गावातून मजल-दरमजल करत, गावोगाव थांबत कसा
आला त्याची मोठी सुरस आणि पाल्हाळिक कथा तिथल्या पुजार्याने सांगितली. मजा
म्हणजे त्याने ज्या ज्या गावांची नावे घेतली ती सर्व गावे मला
सातवाहनकालीन वसाहती/ साईट्स म्हणून माहित आहेत. (म्हणजे विठोबाचा प्रवास
तेवढा जुना नाहीये तर प्राचीन काळापासून असलेली गावे कशी मिथककथांमधे सामील
होतात त्याचे हे मनोरंजक उदाहरण वाटले. ही प्रक्रिया सखोलपणे चिकित्सा
करून अभ्यासणं हा एक संपूर्णपणे वेगळाच मोठ्ठ्या संशोधनाचा विषय होईल.)
तसेच इथे बिरोबाला नवसाचे मेंढे करून वाहतात. मात्र या धनगरांकडे विचारणा
केली असता त्यांनी त्या ताम्रपटाविषयी कधीच काहीच ऐकलेले नाही असे निदान
आम्हाला तरी सांगितले. धनगरांचा विठोबा
मात्र या सर्वेक्षणात ताम्रपटात नमूद केलेल्या ठिकाणी/ दिशेला सर्पशिळा,
इतर कोरलेले दगड इ. मिळाले नाही. पण त्यात फारसे आश्चर्याचे काही नाही.
कारण असे अवशेष हलवून एका जागेपासून दुसरीकडे नेले जाऊ शकतात/ भंगले म्हणून
त्या दगडांचा पुनर्वापर होऊ शकतो इ. इ. तसेच लेखात उल्लेखलेल्या विहिरी,
डोंगर, काही देवतास्थाने इ. वेळेअभावी तपासून बघता आली नाहीत. यासाठी आणखी
सखोल आणि काही दिवस देऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
ऐतवडे बु|| येथील पांढरीच्या मातीने सारवलेल्या भिंती आणि त्यातील खापरे
विश्लेषण-निष्कर्ष
आता या छोटुश्श्या फील्डवर्कमधून काय मिळालं आणि त्याचा काय अर्थ लावायचा? कशी सुसंगती लावायची?
अर्थातच सामाजिक शास्त्रांमध्ये दोन अधिक दोन चार इतकं सरळसोट प्रश्नोत्तर
नसतंच कधी. पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासात मिळालेली उत्तरे ही
तुकड्यांतुकड्यात असतात, त्यांचा वरवर बघता एकमेकांशी संबंध असतोच असे
नाही. शिवाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचीच फक्त नव्हेत तर दुसरेच प्रश्न
उभी करणारी 'उत्तरे' मिळायचीच शक्यता जास्त असते. एका प्रश्नाचे उत्तर हे
अनेको पुढचे प्रश्न आणि विविध दिशेंनी जाणार्या शोधवाटांची किमान झलक असेच
सहसा असते. चिकुर्डे फील्डवर्क याला अपवाद नाही.
या फील्डवर्कचा अगदी सुरुवातीचा उद्देश होता तो म्हणजे ताम्रपटात
उल्लेखलेली दोन पांढरीची स्थळे प्रत्यक्षात सापडताहेत का हे तपासून बघणे.
या दोन उल्लेखांचा तपशील पुढीलप्रमाणे :
- भगवतीपादाच्या (देवीचे ठाण) नजीक एक श्वेत-वालु-म्रितिका असलेले शेत आहे.
आता हा लेख कानडीमिश्रित मराठीत असला तरी बर्याच ठिकाणी तो
'संस्कृतप्रचुर' आहे. संस्कृतमध्ये 'श्वेत-वालु-म्रितिका' असा कुठलाच
वाक्प्रचार नाही. पण मराठीत पांढरी माती याचा निश्चित असा एक अर्थ आहे आणि
तो म्हणजे (जुन्या) वस्तीची जागा. (माझ्या इतरत्र भटकंतीच्या अनुभवांनुसार
पांढरी माती म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट चे कंकर/ डिपॉझिट्स असलेली जागाही
असू शकते. रंगाला खरंचच पांढरी माती असते. पण इथे विचारणा केल्यावर तसे
डिपॉझिट्स परिसरात असल्याची माहिती मिळाली नाही, तेव्हा मग वस्तीची जागा
याच अर्थाने मी ह्याची संगती लावली).
- वराहतराह नामक ओढ्याच्या उत्तरेला धूळमातीचे ढिगारे (रजम्रितिका) असून त्यावर शर आणि परशु अंकन केलेले पाषाण आहेत.
इथे मला ती रजम्रितिका की रज-त-म्रितिका असेल असा एक प्रश्न पडला - म्हणजे
रजतम्रितिका असेल तर परत पांढरीमाती हाच अर्थ निघतो. आपल्याकडे ताम्रपटाची
प्रत्यक्षदर्शी प्रत नसल्याने हे सगळे फक्त 'जर-तारी' कयासच राहणार.
तर या दोन्ही उल्लेखातील एक संभाव्य जागा मिळाली. करंजवडेच्या शिवारांत
असलेली महालक्ष्मी आणि तिच्या शेजारचे शेत (जिथे पूर्वी पांढरी होती) हे
भगवतीपाद आणि तिच्या नजीकचे श्वेत-वालू-म्रितिका असलेले शेत
असण्याचा दाट संभव आहे असा निष्कर्ष आम्ही काढला. मात्र धूळमातीच्या
ढिगार्यांचा किंवा शरपरशुवाल्या शिळांचा पत्ता लागला नाही.
अशा पद्धतीने संशोधनाच्या अगदी प्राथमिक उद्दिष्टात आम्ही काहीसे यशस्वी झाले असलो तरी संशोधनाचे निष्कर्ष एवढ्यावर संपत नाहीत.
या संशोधनाने या ताम्रपटाच्या कालनिश्चितीच्या घोळाचं समाधानकारक उत्तर
दिलं का? हा नक्की १३व्या शतकातला आहे का त्याही नंतरचा आहे? अस्सल आहे की
नकलच्या? बर्याचशा संशोधकांच्या मनात साहजिकपणेच पहिल्यांदा हा प्रश्न
उभा राहील. कारण ताम्रपटाच्या अस्सलतेवरच सहसा त्याचे इतिहाससाधन म्हणून
मूल्य ठरवले जाते.
तर या सर्वेक्षणातून कालनिश्चितीचा गोंधळ समाधानकारक सोडवता आला नाही. बाकी
भाषा व ताम्रपटाचे इतर स्वरूप बघता त्याला इ.स. १३व्या शतकातील मानण्यास
प्रत्यवाय नसावा. पण जर भगवतीपाद हे ठिकाण बरोबर ओळखलं गेलं असेल तर तिथली
मूर्ती मात्र इ.स. १५-१६व्या शतकातील, म्हणजेच मध्ययुगाच्या सुरुवातीची,
आहे. अशा स्थितीत मग लेखाचा काळ त्या मूर्तीनंतरचा मानावा लागेल. त्या
मूर्तीआधी तिथे आणखी प्राचीन, पूर्वीची मूर्ती असल्यास कळण्याचा मार्ग
नाही. किंवा मग भगवतीपादाची स्थळनिश्चिती चुकलेली असू शकते.
एक गंमतशीर बाब म्हणजे हा ताम्रपट तीन ताम्रपटांच्या 'संचा'तील एक आहे
असे दिसते. मरमुरी ताम्रपट व मिरज ताम्रपट हे उरलेले दोन. तीनही वेगवेगळ्या
विद्वानांनी वेगवेगळ्या काळी वाचन करून प्रसिद्ध केलेले हे ताम्रपट
भावसंवत्सराच्या ज्येष्ठ व वैशाख महिन्यात दान दिलेले दिसतात. मरमुरी व
चिकुर्डे एकाच तिथीला (वैशाख कृ. अष्टमी) दिले गेले आहेत, परंतु मरमुरी
सोमवार व चिकुर्डे मंगळवार असा वारनिर्देश करतात. मरमुरी व मिरज हे चालुक्य
राजा वीर सत्याश्रय याचे आहेत तर चिकुर्डे चालुक्य राजा जनमेजय याचा. हा
जनमेजय चालुक्य तुलनेने अप्रसिद्ध असून त्याचे आणखी फक्त तीन ताम्रपट ज्ञात
आहेत. तीन्ही कर्नाटकामधून मिळाले आहेत.
मरमुरी ताम्रपट हा परत कुण्या एका राम गावुंड नामक माहुताला दान दिलेला
आहे. हा आणि चिकुर्डेचा राम गावुंड एकच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मिरज ताम्रपटही अन्य एका माहुताला दान दिलेला आहे - त्याचे नाव सैगोलपा.
या तीनही ताम्रपटांमधील स्थळवर्णनात, भाषेत आणि लेखनशैलीत कमालीचे साम्य
आहे. कदाचित एकाच 'लेखकु' ने ते रचले असावेत अशी शंका येण्याएवढे. तसेच या
स्थळवर्णनशैलीचे जनमेजय चालुक्याच्या अनंतपूर ताम्रपटातील वर्णनाशीही साम्य
आहे.
चालुक्यांच्या काळातील भावसंवत्सरे पडताळून बघता मरमुरी ताम्रपटाचा काळ शके
११९६ (इ.स. १२७४) शी महिना-तिथी-वाराने तंतोतंत जुळतो. राजवाडेंनी जरी हे
वर्ष मराठीची प्राचीनता मागे ओढण्यासाठी नाकारले असले तरी नंतरच्या
अभ्यासकांनी चिकुर्डेची केलेली ही कालनिश्चिती खूपच संभवनीय आहे. मात्र
तिथी-वार जुळत नसल्याने त्याच्या अस्सलतेवरचे पडलेले प्रश्नचिन्ह तसेच
आहे. आणि यामुळेच इतिहासलेखनात, विश्लेषणात या ताम्रपटाला फारसे मूल्य
नाही.
माझे एक पुरातत्वज्ञ म्हणून असे प्रतिपादन आहे की अस्सल-नकली हा अशा
पुराव्यांच्या उपयुक्तता ठरवण्याचा एकच निकष असणे म्हणजे संशोधनाच्या कक्षा
मर्यादित करून टाकणे असते. ताम्रपट जरी नकली असला तरी इथे त्याचे मूल्य
कमी होत नाही. कारण ज्या बारकाईने या लेखात आसपासच्या भौगोलिक आणि
सांस्कृतिक अवकाशाचे तपशीलवार वर्णन आलेले आहे, त्यात कशाप्रकारने
नदी-नाले-डोंगर, शेते-शिवार-विविध प्रकारच्या जमिनी याचबरोबर देवतांची
ठाणे, शिल्पे, कोरीव दगड, पांढरीची टेकाडे, शिल्पे, विहिरी इ. मानवनिर्मित
गोष्टींचाही समावेश आहे, अवकाशातल्या महत्वाच्या खुणा म्हणून या गोष्टी
ओळखल्या जातात (landmarks and/or boundary markers) हे जाणून घेणे व
त्यातून त्या लेखाचे रचनाकार आणि वापरकर्ते यांच्या आसपासच्या परिसराकडे
बघण्याचे सांस्कृतिक दूष्टिकोन समजावून घ्यायचा प्रयत्न करणे हा अतिशय रोचक
असा अभ्यास ठरतो. ज्याला सैद्धांतिक पुरातत्त्वीय परिभाषेत landscape
archaeology असे म्हणतात त्या दृष्टीने चिकित्सा करण्यासाठी असे पुरावे
अनमोल ठरतात. जरी ते मध्ययुगात बनवलेले नकली दस्तावेज असले तरी. शिवाय हे
असे नकली दस्तावेज का बनवले गेले असावेत याचाही अभ्यास रोचक ठरतो. प्रत्येक
वेळेस फक्त जमीनीच हक्क शाबूत रहावा, नव्याने मिळावा म्हणूनच नव्हे तर
इतरही सामाजिक आर्थिक पैलू त्यात असू शकतात. लेखाबरोबरच तत्कालीन इतर
पुरावे, मौखिक इतिहास, पुरातत्वीय अवशेष असे सगळे साकल्याने अभ्यासले तर
अशा कारणांचा माग लागू शकतो (मी अशाच प्रकारचे आणखी एक काम केले आहे. पण ते
अजून प्रकाशित झाले नसल्याने इथे संदर्भ देत नाही. प्रकाशनाला गेले की
त्यावरही एक लेख पाडेन..)
त्यामुळे ताम्रपटांकडे बघताना फक्त अस्सल की नकल हा मुद्दा न बघता त्याचा
साकल्याने विचार करावा, त्यातील मजकुरातील 'सब-टेक्स्ट' बघणे गरजेचे आहे
असे मी इथे आग्रहाने प्रतिपादन करू इच्छिते.
या ताम्रपटात अभूतपूर्व उल्लेख असलेली बाब म्हणजे पांढरीची माती अथवा
टेकाडे. पारंपरिक भारतीय लिखाणातील हा ज्ञात दुसरा तर जुन्या लेखांमधे
मिळालेला हा असा पहिलाच पुरावा होय. या आधी भीमा-माहात्म्य नामक अप्रकाशित
संस्कृत ग्रंथात धूळखेड नामक कर्नाटकातील गावात आढळणार्या नवाश्मयुगीन
राखेचे ढिगार्यांच्या अस्तित्वाचा (हे दख्खनच्या ताम्रपाषाणयुगाला समकालीन
असलेले समाज मोठ्या प्रमाणावर खिल्लारे बाळगत असत व शेणाचे ढिगारे जमवून
जाळत असत. त्यामुळे त्यांच्या वसाहत स्थळांजवळ मोठेमोठे राखेचे ढिगारे
आढळतात) कार्यकारणभाव दक्षयज्ञ झाला तीच ही जागा असे मिथक वापरून स्पष्ट
केला आहे हे मी अन्यत्र एका शोधनिबंधात सप्रमाण दाखवून दिले आहे. मात्र इथे
कुठल्याही मिथकाचा, कथेचा आधार न घेता भवतालच्या परिसरातील एक मोठी खूण
अशा तर्हेने या अवशेषांची दखल घेतली गेली आहे ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे.
मरमुरी ताम्रपटातही असाच पांढरीचा उल्लेख आहे. तसेच जनमेजय चालुक्याच्या
अनंतपूर ताम्रपटाच्या इंग्लिश भाषांतरातही 'mound' असा परिसरातील एका
स्थळाचा उल्लेख केलेला आहे. मात्र आजवर या शब्दाची चिकित्सा/छाननी झालेली
नाही.
पुरातत्वीय सर्वेक्षणाची आखणी करताना कलोनियल/ब्रिटिश काळातील कागदपत्रे,
नकाशे, प्रवासवर्णने व इतर नोंदींचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो. कारण
पाश्चात्य परंपरेनुसार परिसराचे, प्रदेशाचे सर्व बारीकसारीक तपशील,
नैसर्गिक - सांस्कृतिक खुब्या इ, दस्तावेजामध्ये साग्रसंगीत नमूद केलेले
असते. आपल्याकडे पाश्चात्य परंपरेसारखी तटस्थ परिसरवर्णनाची, भौगोलिक
वर्णनाची परंपरा नाही हे खरेच, परंतु तरीही वेगळ्या संदर्भात का होईना पण
पारंपरिक भारतीय साहित्यात असे उल्लेख असू शकतात याचीही जाणीव दुर्दैवाने
आजपर्यंत पुरातत्वशास्त्रात फारशी कुणाला झालेली आढळून येत नाही. किंबहुना
त्या दृष्टीने कधी साहित्य- जुने लेख वाचलेच गेले नाहीत हे खरे!
मात्र वरील दोन उदाहरणे बघता मी असे ठाम प्रतिपादन करू इच्छिते की
सर्वेक्षण आखणी करण्याच्या पद्धतीमध्ये (survey methodology) त्यात्या
प्रदेशाशी संबंधित सर्व प्रकारच्या पारंपरिक साहित्याच, लेखांचा, मध्ययुगीन
कागदपत्रांचा सखोल आढावा घेऊन त्यात असे - म्हणजे पुरातत्वीय अवशेषांकडे
निर्देश करणारे - तपशील आले आहेत का ही तपासणी करणे गरजेचे आहे. वरील
उदाहरणांवरून हे स्पष्ट होते की किमान पूर्वमध्ययुगापासूनचे - साधारण
यादवकाळापासून -समाज त्यांच्या आसपास असलेले पुरातन अवशेष, पांढरीची टेकाडे
याविषयी, त्यांच्या इतर नैसर्गिक भौगोलिक घटकांपेक्षा असलेल्या
वेगळेपणाविषयी जागरूक होते. (माझ्या एका अन्य लेखात गावांची नावे ७-८व्या
शतकापासून कशी संभवतः तिथे मिळणारे जुनी खापरे अथवा पांढरी यावर आधारित
आहेत याचे सप्रमाण विवेचन केले आहे).
दख्खनसारख्या अर्धदुष्काळी प्रदेशात असे दिसून येते की अनेको गावे/ वसाहती
सहसा एकाच जागेवर किंवा त्याच परिसरात जवळपास जागा बदलत हजारो वर्षे
अस्तित्वात आहेत. मध्ययुगात किंवा पूर्वमध्ययुगात (early medieval) काळात
महत्वाची गणली जाणारी स्थळे खूप प्राचीन असण्याचा संभव असतो हेही मला भीमा
खोर्याच्या सर्वेक्षणात सप्रमाण लक्षात आले आहे. आजपर्यंत सर्वेक्षण आखणी
करताना भौगोलिक व प्रादेशिक घटक, पाणी-जमीन इ, ची उपलब्धता/अभाव,
दळणवळणाच्या मार्गांशी संबंध या व अशा घटकांना प्रामुख्याने लक्षात घेतले
जाते. प्राचीन साहित्याचा वापर फक्त गावांची नावे व त्यांचे प्रशासकीय
स्थान, व्यापाराशी संबंध यांचे उल्लेख आहेत का हे जाणून घेण्यासाठी केला
जातो. पण त्यापल्याड जाऊन असे प्राचीन, पूर्वमध्ययुगीन व मध्ययुगीन
दस्तावेज तपासून पुरावशेषांचे तपशील आले आहेत का ते तपासून त्या माहितीचा
अंतर्भाव जाणीवपूर्वक सर्वेक्षण आखणीतील आधारभूत घटकांमध्ये केला जाणे
गरजेचे आहे.
या सगळ्यात शेवटी - ज्याचा या ताम्रपटाच्या संशोधनाशी थेट संबंध नाही,
ज्याच्या शोधासाठी मी माझ्या मूळ संशोधनक्षेत्रात वणवण भटकले पण फारसं काही
हाताला लागलं नाही, त्याची गाठभेट 'भलत्या वेळी, भलत्या मेळी, असता मन
भलतीचकडे' अशा अवस्थेत इथे पडली
मांगलेतल्या एका चौकातून सहज म्हणून माझ्या मित्राने एक खापर उचलले, तर ते
दख्खनच्या ताम्रपाषाणयुगातील सुरुवातीच्या कालखंडातील - माळवा कालखंडातील -
खापर निघाले. लखलखीत गेरू रंगाच्या खापरावर काळ्या रंगाने काढलेली सुंदर
नक्षी असलेले. आणि चिकुर्डे आणि देवर्डेमधून ताम्रपाषाणयुगाच्या अंतकाळाची,
उत्तरजोर्वे कालखंडाची, छोटीछोटी खापरे मिळाली. आजवर इनामगावचे उत्खनन व
भीमा खोर्यातल्या मला व माझ्या आधीच्या इतर काही संशोधकांना मिळालेल्या
स्थळांशिवाय उत्तरजोर्वे खापरे बाहेर कुठेच कधीच मिळाली नव्हती. ती इथल्या
सुपीक, उत्तम पाऊस आणि बारमाही पाणी उपलब्ध असलेल्या प्रदेशांतून मिळाली हा
अतिशय महत्वाचा शोध आहे. आपल्याला पश्चिम दख्खनच्या इतर प्रदेशांतही
बारकाईने सर्वेक्षण करण्याचा आणि त्यातून मिळणार्या माहितीच्या संदर्भात
या अंतकाळाचा एकदा साकल्याने फेरविचार करायची नितांत गरज आहे या माझ्या
आधीपासूनच्या गृहितकावर या शोधाने शिक्कामोर्तब झाले.
उपसंहार
तर अशी ही आमच्या दोन दिवसांच्या फील्डवर्कची पाचा प्रश्नांची कहाणी.. ती
साठां उत्तरी सुफळ संपूर्ण नाहीच नाही. साठां प्रश्नांना जन्म देणारी मात्र
दिसतेय.
एका ताम्रपटातल्या नोंदीची सहज म्हणून पडताळणी करायला निघाल्यावर त्या
बिंदूपासून विविध दिशेला शोधवाटा, त्यांना फुटणारे आणखी फाट्यांसकट,
दिसलेल्या आहेत. त्यातल्या काही महत्वाच्या वाटांचा इथे फक्त उल्लेख केला
आहे.
माझ्या दृष्टीने यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुराभिलेखांच्या
अभ्यासाची, विश्लेषणाची मी नव्याने संशोधनपद्धती मांडायचा प्रयत्न करते आहे
आणि त्या दिशेने हे काम हे दुसरं भक्कम पाऊल आहे. (पहिले काम अजून
अप्रकाशित आहे). वरती लिहिल्याप्रमाणे मी पुराभिलेखतज्ञ नाही पण माझ्या मते
निदान पुरातत्वज्ञांनी या इतिहाससाधनांचा वापर त्यातील ढोबळ तपशील
वापरण्याच्या पल्याड जाऊन केला पाहिजे. लेखांमध्ये उल्लेखलेल्या स्थळांना
भेट देऊन सर्वेक्षण करून स्थळ निश्चिती करणे तसेच त्या वसाहतींचे
सांस्कृतिक कालानुक्रम/इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच या लेखांमध्ये
आलेली माहिती त्यात्या स्थळांतील पुरातत्वीय अवशेष, मौखिक इतिहास, दंतकथा
(रामायण-महाभारत-पुराणातल्या दैवी कथा अशी मिथके सोडून), तिथल्या
सामाजिक-धार्मिक-आर्थिक परंपरा यांच्या संदर्भात पडताळून बघितली तर
आपल्याला त्या लेखांमधे असलेल्या empirical माहितीपलिकडे जाऊन काही तथ्ये
उजेडात आणता येतात. वरती नमूद केलेल्या या विविध इतिहाससाधने व परंपरा
यांची मिळवणी त्यांच्या एकूण बेरजेपेक्षा कितीतरी जास्त होते. मात्र ती
मिळवणी कशी करायची याची अभ्यस्त व सुजाण दृष्टी हवी हे तितकेच खरे!
भरतवाक्य!
Archaeology, after all, is nothing but an exercise of a common sense!!
डिसेंबरमधली
एक टळटळीत दुपार. उत्तर कर्नाटकातल्या भीमाकाठच्या एका गावंढ्या खेड्यात
मी दुपारच्या विश्रांतीसाठी जरा टेकले आहे. हेमाडपंती देवळाच्या ओसरीत
माझ्याशिवाय कुणीच नाही. गावाकडे जवळजवळ पाठ करून नदीसन्मुख निवांत देऊळ.
नदीपासून वरती वीसपंचवीस फूट काठ, त्यावर चौथरा बांधून देऊळ. देवळासमोर,
नदीच्या काठावर, पायर्या उतरताना सुरुवातीलाच एक सिमेंटचा कट्टा करून
आसपास मिळालेली शिल्पे ओळीने मांडून ठेवली आहेत. बैजवार हळदीकुंकू वगैरे
वाहून. सकाळपासून बाहेरच्या उन्हात तापून आता इथला थंडावा अंगात भिनवत मी
डोळे मिटून बसले आहे. माझ्या भटकंतीचा आणि कामाचा मनातल्या मनात हिशोब
लावत.
तुफान मेलसारखी धावणारी कर्नाटकची सरकारी एस्टी राष्ट्रीय महामार्गावर
मला रोज सकाळी उतरवते. तिथून डावीकडे पूर्वेला एक फाटा फुटतो त्यावरून आत
अर्धा किलोमीटरवर गाव आहे. तो रस्ता तसाच पुढे वळून आणखी दोन तीन गावांकडे
जातो. गावाजवळून नदी वाहते. अर्धदुष्काळी रुक्ष दख्खनमध्ये ज्या काही
मोजक्या बारमाही नद्या आहेत, त्यातली एक. एरवी वळणंवाकणं घेणारी नदी इथे
अगदी सरळ उत्तर दक्षिण वाहते. नदीच्या अल्याड पश्चिमेला कर्नाटक आणि पल्याड
पूर्वेला महाराष्ट्र. तीच अधिकृत सीमा. पण कानडी भाषेची सीमा मात्र दक्षिण
महाराष्ट्रातच सुरू झालेली असल्याने इथे मराठी येणारे लोक अगदी नाममात्र.
सगळाच अगम्य कन्नडी कारभार.
दख्खनच्या आद्य शेतकर्यांच्या वसाहतींच्या शोधातला हा माझा एक महत्वाचा
थांबा आहे. एरवी इतर चार खेड्यांसारखंच हे पण एक गाव, पण आम्हा दख्खनच्या
पुरातत्वशास्त्रज्ञांसाठी गेली पन्नासहून अधिक वर्षे एक प्रसिद्ध 'साईट'.
साडेतीनचार हजार वर्षांपूर्वीचं एक आद्य शेतकर्यांचं गाव इथे होतं त्याचे
अवशेष १९५७-५८ मध्ये प्रथम नोंदले गेले.
ही माझी इथली पहिली भेट नाही. माझ्या शोधमोहिमेच्या आरंभीच्या टप्प्यात
इथे मी पहिल्यांदा आले. अगदीच नवखी असताना, माझ्या विषयातली नोंद झालेली
पुरातत्वीय संस्थळे आता कशी आहेत हे तपासायच्या कामासाठी मी सोबतीला एक
मैत्रिण घेऊन आले होते. कर्नाटकातल्या जवळच्या एका मोठ्या शहरात रीतसर
हॉटेलमध्ये मुक्काम करून सरकारी खात्याची मदत आणि गाडी घेऊन इथे आल्याची
आठवण अगदी ताजी आहे --
माझ्याकडे उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार या गावात/गावाशेजारी एक मोठ्ठं
राखेचं टेकाड आहे आणि त्यात ताम्रपाषाणयुगीन खापरे व इतर अवशेष सापडतात. या
नोंदी केल्या आहे दिग्गज दख्खनी पुरातत्वज्ञांनी. ए. सुंदर, के. पद्दय्या
आणि म. के. ढवळीकर. बाप माणसं. त्यांच्यावरती
बोलायचं कामच नाही! हे असे राखेचे ढिगारे कर्नाटक व आंध्र प्रदेशात चिकार
सापडतात. इथल्या आद्य नवाश्मयुगीन शेतकर्यांच्या वसाहतींशी निगडित, सुमारे
तीन हजार वर्षे जुने, असे हे अवशेष आहेत. निओलिथिक अॅशमाउण्ड्स. मात्र
ज्यात दख्खनच्या ताम्रपाषाणयुगाचे अवशेष मिळाले आहेत असं हे एकमेव ज्ञात
राखेचं टेकाड. त्यामुळे प्रथम भेटीत फारच उत्सुकता होती. गावाच्या
दक्षिणेला, रस्त्यावरून गावात शिरताना लगेचच एक छोटंसं बारापंधरा फूट
उंचीचं आणि सुमारे तीसचाळीस फूट परिघाचं हे टेकाड आहे. त्यावर सगळीकडे
वाळकं कुसळी काटेरी गवत उगवलं आहे आणि वरती शंकराची पिंड, सतीचा हात वगैरे
जुने अवशेष ठेवून त्याचं शंकराचं पवित्र ठाण केलेलं आहे. कारण अगदी सरळ
आहे. गावकर्यांच्या मते लोकपरंपरा असं सांगते की दक्षयज्ञ झाला हीच ती
जागा. आणि सतीने ज्या यज्ञकुंडात जीव दिला तेच हे ठिकाण. त्यानंतर शंकराने
रागाने सगळं यज्ञस्थळ भस्मसात् केलं. म्हणून तर एवढी राख इथे सापडते.
गावाचं नावच मुळी या राखेवरून आलंय. धूळखेड. इथे धूळ म्हणजे राख. राखेचं
गाव.
अजूनही या टेकाडावर जरा मातीत हात घातला की खापरं, हाडं, दगडाची
सूक्ष्मास्त्रं असं कायकाय मिळतं. वरती चप्पल काढून जायला लागतं. तर
पहिल्यांदा आलेले असताना चढून वरती निरिक्षण करणं अत्यावश्यकच होतं. आपले
सपाता, शूज अशाला सरावलेले शहरी नाजुकसाजुक तळपाय. पहिलं पाऊल टाकल्यावरच
ब्रह्मांड आठवलं होतं इतके काटे रुपले होते. पण या टेकाडावर येऊन मी आणि
माझी सखी उभी राहिलो आणि चौफेर नजर फिरवली तर काय! अहो आश्चर्यम्!
टेकाडापासून केवळ पन्नास साठ पावलं उत्तरेला असलेलं गाव एका मोठ्ठ्या
पांढरीच्या टेकाडावर वसलेलं होतं. किमान पंधरा फूट उंच. या पांढरीविषयी
कुणीच आधी काही उल्लेख केलेला नाही. जवळ जाऊन बघितलं तर सलग चारसाडेचार
हजार वर्षांचा इतिहास पुस्तकात आखलेल्या सेक्शनसारखा डोळ्यासमोर उभा होता.
विविध काळातील जमिनी, दफनं, भिंती, खापरं, दगडी हत्यारं, आणखी कायकाय
सगळंच्या सगळं त्या अर्धवट खणलेल्या पांढरीच्या टेकाडात सलग खालपासून
वरपर्यंत दिसत होतं. याचा उल्लेख नोंदींमध्ये नाही म्हणजे आधीच्या
दिग्गजांपैकी कधीच कुणाच्या हे लक्षात आलं नाही की गावाखालीही पांढर आहे.
मी प्रत्यक्ष विचारूनही घेतलं त्या तिघांना तर आम्हाला दिसलं/कळलं नाही असं
प्रामाणिक उत्तर मिळालं. असंही होतं तर कधी कधी... शेवटी दाने दाने पर
लिखा है| हेच खरं.
माझ्या संशोधनाचे बरेचसे आडाखे या पांढरीच्या टेकाडाच्या शोधाने एकदम
एका झटक्यात बदलले! तेव्हाच ठरवलं होतं की या गावासाठी वेगळा वेळ देऊन आणखी
खोलात इथे सर्वेक्षण करायचं.
त्याप्रमाणेच मी गेले काही दिवस सातत्याने इथे संपूर्ण परिसराचे
सर्वेक्षण केले आहे, आणि आता बहुतेक सगळ्या उठून दुसरीकडे गेलेल्या ओसाड
वस्तीमधला एक टेकाडाचा उरलासुरला भाग निवडून त्यात एका उभ्या कडेची तासणी
करते आहे. इथल्या वसाहतींचे स्तर कसे आणि काय प्रकारचे आहेत हे बघणे,
विशेषतः ताम्रपाषाणयुग आणि आद्य ऐतिहासिक काळ (सातवाहन काळ) यांचे अवशेष हे
माझ्या अभ्यासाचे केंद्रबिंदू आहेत. तासणी करताना दिसलं की फक्त राखेच्या
टेकाडातच राख मिळत नाही तर पूर्ण गावातच राखेचे दोन मोठे थर जमिनीखाली
आहेत. तासणी करत करत जमिनीखाली तीनेक फूट गेल्यावर दगडासारखा घट्ट झालेला
राखेचा थर लागला. मलाच काय पण मजुरांनाही कुदळीने तो पटकन फुटत नव्हता.
याच्या वरती सातवाहन काळातील खापरे व पुरावशेष होते. या थराखाली एक मातीचा
थर की परत आणखी एक तेवढाच घट्ट झालेला राखेचा थर. या सगळ्यांमध्ये
ताम्रपाषाणयुगीन खापरे, हाडे, दगडाची सूक्ष्मास्त्रे. जळलेली, न जळलेली.
बाकी मी पहिल्या भेटीत जी मोठ्ठी पांढर बघितली होती ती आता जवळजवळ संपली
आहे. गाव उठून दुसरीकडे गेलं आहे. फक्त यादवकाळात निर्माण झालेल्या आणि
मराठा काळात जीर्णोद्धार झालेल्या मोठ्या भीमाशंकरलिंग देवळाच्या आसपास
पांढर आहे. पण तिथे तासणं हे कदाचित देवळाच्या पायासाठी धोकादायक ठरू शकतं.
म्हणून तो भाग सोडून एक त्यातल्यात्यात धडका उभा तास (सेक्शन) निवडला आहे.
तेव्हा खूप तपशीलात काही पुरावशेष मिळणार नाहीत हे माहितच आहे. जे आहे
त्याची काळजीपूर्वक नोंदणी करणे हे महत्वाचे. ते करते आहे.
गावासभोवती सर्वेक्षण करताना लक्षात आलं की नदीच्या पल्याडच्या गावातही
सातवाहन काळापासून आजपर्यंत सलग पुरावे मिळत आहेत. एवढंच नव्हे तर या
गावाच्या उत्तरेला एका ठिकाणी शेताडामध्ये मध्ययुगीन खापरेही मिळत आहेत.
तिथेच म्हसादेवीचं ठाण आहे. इथे आणखी एखादं छोटं पांढरीचं टेकाड असलं तरी
आता त्याचा मागमूसही नांगरलेल्या, उभ्या पिकाखाली असलेल्या मातीत नाही.
धोधो वाहणारी नदी सगळ्या इतिहासाला साक्षी, पण आपल्यासाठी तीही कामाची
नाही. तेव्हा खापरं, माती, राख, हत्यारं, औजारं, हाडं हेच आपले मदतनीस.
त्यांच्या तुकड्यांतुकड्यातून अर्थ जुळवत गावाची पाळंमुळं शोधत इथल्या
माणसांची आणि देवाची गोष्ट लिहायची.
पण यावेळेस आणखी एक पुराव्याचा माग सापडला आहे. भीमामाहात्म्य.
आपल्याकडे वेगवेगळ्या नद्यांची, तीर्थक्षेत्रांची माहात्म्ये रचलेली
आढळतात. त्यातलाच एक अप्रकाशित संस्कृत ग्रंथ. त्याची एक संक्षिप्त मराठी
आवृत्ती पूर्वी कधीतरी प्रसिद्ध झाली आहे. पण एकुणातच एखाददोन संशोधक सोडून
या ग्रंथाची दखलही अभ्यासक्षेत्रात कुणी घेतलेली नाही. पहिल्यांदा याचा
उल्लेख केला तो दामोदर धर्मानंद कोसंबींनी. त्यांचाच हात धरून मी या
हस्तलिखितांपर्यंत पोचले आहे. भीमेच्या काठी असलेल्या विविध
तीर्थक्षेत्रांची माहिती असे त्याचे स्वरूप आहे. एकूण ज्या
तीर्थक्षेत्रांची माहिती आहे ती बघता माझ्यामते मध्ययुगाच्या थोड्या आधी हा
ग्रंथ रचला गेला असणार. कारण त्याकाळची प्रसिद्ध क्षेत्रे आणि आजची
प्रसिद्ध क्षेत्रे यांचा ताळमेळ पूर्णपणे बसत नाहीये. यादीत फरक आहे. आजचं
अनाम अप्रसिद्ध धूळखेड मात्र आख्ख्या एका अध्यायाची रचना व्हावी इतकं
तेव्हा महत्वाचं होतं.
या ग्रंथातही क्षेत्रमाहात्म्यात दक्षयज्ञ आणि सतीचीच कथा येते. म्हणजे
इथली लोकपरंपरा काय आहे हे ग्रंथकाराला माहित होतं. या ग्रंथाच्या
विश्लेषणातून अतिशय रंजक तथ्यांचा, ऐतिहासिक सांस्कृतिक प्रक्रियांचा मला
मागोवा घेता आला, पण तो भाग इथे अलाहिदा आहे. आपल्याला मतलब फक्त धूळखेडशी.
पुरातत्वीय पुरावे, ऐतिहासिक कागदपत्रांतील उल्लेख/अनुल्लेख,
ग्रंथांमधील माहात्म्यकथा, मौखिक इतिहास आणि प्रत्यक्ष गावाचे अवलोकन अशा
विविध प्रकारचे पुरावे एकत्र तपासून बघितले की या गावाच्या आयुष्याचा एक
विस्तीर्ण पट आपल्या डोळ्यासमोर उलगडतो. तो पट पूर्ण नाही, त्यातले
अधलेमधले महत्वाचे टप्पे आपल्याला निश्चितपणे ठाऊक आहेत. पण बाकी तपशील
बरेचदा अनुमानानेच भरावे लागतात. अर्थात त्याने जीवनपट समजून घ्यायला फार
अडथळा येत नाही.
गावाची जन्मकहाणी सुरू होते ती जवळजवळ साडेचार हजार वर्षांपूर्वी.
दख्खनच्या भूमीत नुकतंच शेतीतंत्रज्ञान नव्याने आलं होतं. इतकी लाखो वर्षे
भटक्या अवस्थेत शिकार, फळं-कंदमुळं यावर गुजराण करणार्या माणसांच्या
टोळ्या आता धान्याची लागवड करून, प्राण्यांना माणसाळवून एका ठिकाणी वस्ती
करून राहायला शिकत होत्या. पूर्ण पश्चिम दख्खन, आंध्र, दक्षिण कर्नाटक असे
प्रांत कवेत घेऊन ही नवी जीवनशैली वेगाने पसरत होती. पश्चिम दख्खनच्या
गावसमूहांना तांबं गाळायचं तंत्रज्ञान अवगत झालं होतं. पण आंध्र
कर्नाटकमधले गावसमूह याबाबतीत अज्ञानी होते. हे त्यात्या प्रदेशातील आद्य
शेतकरी समूह असले तरी त्यांच्या जीवनशैलीत फरक होता. पश्चिम दख्खनचे
शेतकरी शेतीवर भर देत असत तर कर्नाटक-आंध्रातील समूह मूलतः पशुपालनावर भर
देत. शेती करत असले तरी मोठीमोठी खिल्लारे बाळगत. त्या खिल्लारांना एकत्र
सामुदायिकरीत्या गावाशेजारीच बांधून ठेवले जाई व त्यांचे शेण एकत्र करून
थोड्याथोड्या काळाने ढीग करून जाळले जाई. वारंवार एकाच ठिकाणी जाळून सगळी
राख दगडासारखी घट्ट होई. हेच ते आपल्यापर्यंत पोचलेले नवाश्मयुगीन राखेचे
ढिगारे. दख्खनचे आद्य शेतकरी मात्र असे काही करत असल्याचे पुरावे उपलब्ध
नाहीत.
तर धूळखेडची कहाणी सुरू होते साधारण चारेक हजार वर्षांपूर्वी.
त्यावेळच्या माणसांनी बारमाही वाहणार्या नदीच्या या उंच काठाची निवड
कायमच्या मुक्कामासाठी केलेली दिसते. नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक.
गाळाची माती तर होतीच पण करंद काळी मातीही मुबलक प्रमाणात. उन्हाळ्यातही
पाणी उपलब्ध, चराऊ कुरणांची कमतरता नाही आणि पूर आला तरी उंच काठ गावाचं
रक्षण करण्यास सहसा पुरेसे पडणारे. तेव्हा या उजव्या काठावर थोड्या थोड्या
अंतराने तीनचार ठिकाणी गावं वसवलेली दिसतात. धूळखेड त्यातलंच एक. या
शेतकर्यांनी काठापासून थोडं आतच एक छोटं गाव वसवलं आणि दक्षिणेकडच्या
शेजार्यांसारखी खिल्लारे बाळगून त्यांचं शेण एकत्ररीत्या जाळण्याचा परिपाठ
सुरू केला. अर्थातच त्या काळी गावाचं नाव काय होतं आपल्याला माहित नाही.
त्यांची भाषाच जिथे जाणून घ्यायचा कुठला मार्ग नाही तिथे हे सगळे तपशील
आपल्यासाठी हरवूनच गेलेत. आपण यालाही धूळखेडच म्हणूयात.
तर साधारण हजारेक वर्षं हे गाव इथे सुखासमाधानाने नांदत असलेले दिसते.
मात्र इ स पू १००० च्या सुमारास दख्खनमधल्या पावसाच्या वार्षिक चक्रात
बिघाड होण्यास सुरुवात झाली. अवर्षणाचा फेरा वारंवार होऊ लागला, दुष्काळी
परिस्थिती वाढू लागली आणि नागरी प्रशासकीय यंत्रणांचा आधार अस्तित्वातच
नसल्याने शेतीवर गुजराण करणं अवघड झालं. हळूहळू कमी पावसावर तगून
राहणार्या पिकांवर, गोमांसाऐवजी काळविटाच्या मांसावर उपजीविका
चालवण्यावरचा भर वाढत गेला. आणि शेवटी हेही पुरेनासे झाल्यावर गावंच्या
गावं जगायला बाहेर पडली. स्थिर जीवन सोडून परत एकदा पायाला भटकंतीचं चाक
लावून. पुढच्या सहासातशे वर्षांसाठी. इतर गावांबरोबरच इथलेही लोक जगायला
बाहेर
पडलेले आपल्याला दिसतात. परत कधी त्यांचे वंशज इथे आले की नाही कळायला
काहीच मार्ग नाही. पण मौर्यकाळानंतर, इ.स.पू. दुसर्या शतकानंतर परत एकदा
दख्खन गावांनी फुलून उठला. सुधारलेल्या नियमित पाऊसमानाने आता बर्यापैकी
सुबत्ता आली होती. दख्खनमधलं पहिलं राजकुल सातवाहन आता दिमाखात राज्यावर
आलं होतं. अंतर्गत आणि परदेशी भूमध्यसमुद्रप्रदेशाशी असलेला व्यापार आता
भरभराटीला आला होता. नाशिक, कोल्हापूर, तेर, कराड, बेळगाव, सन्नती अशी
मोठीमोठी राजकीय-व्यापारी केंद्रे असलेली नगरे उदयाला आली होती. आणि
यामधल्या प्रदेशांत पसरलेली असंख्य छोटीछोटी खेडेगावे.
धूळखेडमध्येही लोकांनी परत एकदा नव्याने डाव मांडला. एक छोटंसं गाव परत
एकदा वसलेलं आपल्याला पुरावशेषांवरून कळतं. पण इतर चार खेड्यांसारखंच हेही
एक असणार. पोटापुरतं पिकवून, गाईगुरं सुखात राहिली की झालं इतक्याच आर्थिक
उलाढालीचं. ना इथे आसपास कुठलं मोठं नगर, ना कुठले धार्मिक स्थान. ना कुठला
व्यापारीमार्ग जवळपासहून जात असल्याचे काही पुरावे! भीमा नदीही सातवाहन
काळासाठी
सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची नसावी असे दिसते. इ.स. च्या सातव्या शतकाआधी,
बदामी चालुक्य राजवटीआधी, भीमेचा कुठे म्हणजे कुठेच उल्लेख नाही. गोदा,
कृष्णा, तापी, नर्मदा सगळ्या आहेत पण हिचा मागमूसही साहित्यात, शिलालेखात
कुठे नाही.
परिस्थिती पालटते ती साधारण सहाव्या सातव्या शतकापासून. बदामी चालुक्य
राजघराणे राज्यावर आल्यावर इथल्या आसपासच्या परिसराविषयी ताम्रपट,
शिलालेखांतून माहिती मिळू लागते. पण या सगळ्या प्रदेशाचा खरा भरभराटीचा काळ
म्हणजे साधारण दहावे शतक ते चौदाव्या शतकाचा पूर्वार्ध. ज्याला आपण सहसा
यादवकाळ म्हणतो. फक्त देवगिरीचे यादवच नव्हेत, तर शिलाहार, मंगळवेढ्याचे
कलचुरी, कल्याणीचे चालुक्य अशा विविध राजवटी आता या प्रदेशांमध्ये
एकमेकांशी चुरस करून राज्ये चालवताना दिसतात. याच काळात ठिकठिकाणी देवळं,
जैन बसदि बांधली गेली, त्याला राजांनी, त्यांच्या अधिकार्यांनी सढळ हस्ते
दाने दिली. आणि याच काळाच्या शेवटच्या टप्प्यात भीमामाहात्म्याची रचना झाली
असावी असा माझ्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
गावाच्या इतिहासातही आता एक नवा टप्पा आलेला दिसतो. आपल्याला पहिल्यांदा
गावाचं नाव कळतं. धूळखेड. आपलं गाव इतरांपेक्षा वेगळं आहे, इथे इतर कुठे न
सापडणारी राख गावभर जमिनीत खणलं की मिळते हे लोकांना माहित असणारच. पण
त्या वेगळेपणाचं स्पष्टीकरण म्हणून आता त्याच्याशी दक्षयज्ञाची कथा जोडली
गेलेली दिसते. निश्चितच याच्या आधी काही शतके ही घडामोड झालेली असणार.
साधारण पाचव्यासहाव्या शतकापासून किंवा कदाचित त्याच्याही आधीपासून
आसपासच्या जुन्या पुरावशेषांची नोंद दख्खनमधील गावं घेऊ लागली आहेत असं
माझं प्राथमिक संशोधन मला सांगतं. या नोंदीची माहिती आपल्याला गावांच्या
नावांवरून कळते. तर त्यातलंच एक धूळखेड. या राखेच्या ढिगार्यांवरून
दंतकथा, मिथककथा रचल्या जाणं हे कर्नाटक, आंध्रप्रदेशांमध्ये सुद्धा दिसतं.
गाणगापूरला प्रख्यात असणारा भस्माचा डोंगर असाच नवाश्मयुगीन राखेचा. पण
गाणगापूरचं मध्ययुगातील दैवतीकरण सोडलं या सांस्कृतिक प्रक्रिया किती
जुन्या आहेत हे आपल्याला इतके दिवस कळायचा मार्ग नव्हता. त्याचा पहिला माग
आपल्याला भीमामाहात्म्याने दिला.
आणि याच काळात बांधलेले शंकराचे दगडी देऊळ, आसपास मिळणारी समकालीन शिल्पे
आपल्याला हे गाव भीमामाहात्म्यात एक आख्खा अध्याय ज्यावर खर्ची पडला आहे
इतक्या महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून महत्वास पावले आहे याचा भक्कम पुरावा
देतात. मात्र असे असूनही याचा उल्लेख अन्यत्र कुठे शिलालेखात नाही, कुठल्या
दानांच्या नोंदी नाहीत की याला कधी कुठला प्रशासकीय-राजकीय दर्जा मिळालेला
दिसत नाही. फक्त आणि फक्त तीर्थक्षेत्र असेच याचे स्वरूप राहिलेले दिसते.
या भागात असलेला लिंगायत प्रभाव इथेही दिसून येतो. जरी माहात्म्यात हे
नुसते शैवक्षेत्र म्हणून उल्लेखित असले त्यानंतर ते लिंगायत पंथात सामिल
झालेले दिसते. आजही आहे.
या महत्वाची चढती कमान मध्ययुगातही चालू राहिली असावी. कारण शेताडात
मिळालेला खापरांचा पुरावा आपल्याला या वसाहतीचा वाढता विस्तार किंवा संलग्न
वाडी-वस्ती असावी असे सांगतो. इतकंच काय पण ब्रिटिश काळातील गॅझेटीअर
सुद्धा या गावाचा महत्वाच्या स्थळांत उल्लेख करून इथल्या राखेचा व
दक्षयज्ञकथेचा उल्लेख करतात. अर्थातच हे मिथक जोडले गेलेले नवाश्मयुगीन
राखेचे ढिगारे धूळखेड सोडून दख्खनमध्ये आणखीही काही ठिकाणी आहेतच, पण
त्यांचा विशेष अभ्यास झालेला नाही.
धार्मिक महत्व सोडून इतर कुठलाही वेगळा दर्जा नसल्याने गावाची
मार्गक्रमणा फार वेगळी ठरली नाही. सातवाहन काळापासून खेडं म्हणून
अस्तित्वात असलेलं हे ठिकाण विसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत खेडंच राहिलं.
शंकराच्या देवळाला, राखेच्या ढिगार्याला सांस्कृतिक केंद्रबिंदू करून
जगणारं. बाकीचं जग झपाट्याने बदललं तसं याचं धार्मिक महत्वही स्थानिक
पातळीवर संकुचित होऊन राहिलं.
मात्र १९९३ साली किल्लारीचा भूकंप झाला आणि गावाच्या आयुष्यात उलथापालथ
करून गेला. पांढरीच्या टेकाडातच पाये घालून बांधलेली दगडी घरे धडाधडा
कोसळली. त्यामुळे नाईलाजाने गावाने स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.
गावाच्या पश्चिमेकडून जाणार्या राष्ट्रीय महामार्गापल्याड एक माळरान बघून
गावाने तिकडे पक्क्या पायाची घरे बांधली. पूर्वीच्या काळच्या दळणवळणाचा
मुख्य मार्ग असलेल्या नदीची जागा आता रस्त्याने
घेतली. इथून लागेल तशी पांढरीची माती खणून तिकडे नेली आणि घरबांधणीत वापरली. ज्या पांढरीमुळे गावाला महत्व मिळालं, नाव मिळालं त्या
पांढरीमुळेच गावाला दुसरीकडे स्थलांतर करणं भाग पडलं.
गावात अजूनही शंकर त्याच्या देवळात बसून आहे. तो अजून तरी नवा धूळखेड
मध्ये राहायला गेला नाहीये. कसा जाईल? त्याचं आद्यस्थान - तो राखेचा ढिगारा
- अजूनही तिथेच आहे. परवाच्या (२०१९च्या) महापुरात इतक्या उंचीवर बांधलेलं
हे भीमाशंकरलिंगाचं देऊळही पूर्ण बुडलं होतं अशी उडतउडत बातमी
वर्तमानपत्रात वाचली. आता पूर ओसरला असेल. गाळ साफ झाला असेल. पूजाही सुरू
झाली असेल, कारण अजूनही गावातले लोक नियमाने देऊळ आणि ठाण या दोन्ही ठिकाणी
पूजा करतात.
कदाचित आणखी काही दिवसांनी कुण्या थकल्याभागल्या
म्हातार्याला/म्हातारीला स्वप्नात दृष्टांत मिळेल आणि त्याच्या सोयीसाठी
शंकर येईलही जुनं देऊळ सोडून नवा धूळखेड मध्ये. कुणी सांगावं?
(हा लेख प्रथम माहेर दिवाळी अंक २०१९ येथे प्रसिद्ध झाला. तो इथे
पुनर्प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल माहेरच्या संपादिका सुजाता
देशमुख यांची मी ऋणी आहे.)
No comments:
Post a Comment