• देवनागरीपेक्षा मोडी लिपीत जलद गतीने लिहिता येते. मोडी लिपी ही देवनागरीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते.
• मोडी लिपीत केवळ एकाच 'ई' काराचा व 'ऊ' कराचा वापर होतो त्यामुळे ऱ्हस्व-दीर्घ च्या चुका कमी होण्यात मदत होते. मोडी लिपीत दोन अक्षर एकमेकांना जोडून लिहिण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे, लेखणी वारंवार उचलण्याचा प्रसंग कमी येतो व त्यामुळे लिखाणाची गती वाढण्यास मदत होते.
• मोडीतील जोडाक्षरे ही संस्कृत भाषेचे नियम पाळतात.
• मोडीतील जास्तीत जास्त अक्षरे ही 'नागरी' आहेत. 'काने' चा उपयोग वरच्या बाजूला तसेच पुढील अक्षराला जोडण्यासाठी केला जातो.
• 'ई', 'ज', 'झ', 'त्र', 'ट', 'द', 'ध' ही मोडी अक्षरे 'नागरी' तील घसाटी पद्धतीने लिहिली जातात. उ. दा. गुजराती व महाजनी.
• अनुस्वाराच्या बाबतीत मोडीचे स्वतंत्र नियम आहेत.
• डोक्यावरील आडवी रेषा वाक्याचे लिखाण सुरू करण्यापूर्वी आखून घेतात जेणेकरून लिहिताना सारखा हात उचलावा लागू नये, ज्या गोष्टीची गरज नागरी लिहिताना भासते. प्रत्येक शब्दावर रेघ देण्याचा वेळ त्यामुळे वाचतो.
• थोडक्यात मोडी ही घसाटी पद्धतीने लिहिलेली नागरी होय.
• अतिशय मोजक्या ठिकाणीच लेखणी उचलली जाते.
• मोडी अक्षराची सुरवात व शेवट वरच्या ओळीवर असतो.
• मोडी अक्षरांना कुठेही टोके नकोत. सगळी अक्षरे अतिशय वळणाकृती व गोलाकार असली पाहिजे.
• जोडाक्षर 'बाळबोध' पद्धतीने लिहिली जातात.
• 'आ'कार व 'काना' लिहिताना रेषा खालून वर अशी ओढली जाते.
• 'ई'कार लिहिताना वेलांटी पाठोपाठ 'काना' लिहिला जातो. सगळ्या मात्रा ह्या शब्दाच्या शेवटी दिल्या जातात.
मोडी लिपी शिकतांना/वाचतांना घ्यावयाची काळजी -
•मोडी लिपीमध्ये वेगवेगळ्या अश्या ४८ अक्षरांचा समावेश असतो, त्यामधे ३६ व्यंजने तर १२ स्वर असतात.
•लिखाणाची सुरवात करण्यापूर्वी, संपूर्ण पानावर आडव्या रेषा मारून मग दोन रेषांच्या मध्ये ही लिपी लिहिली जाते.
• ह्या लिपीत विराम चिह्नाचा किंवा उभयान्वयी अव्ययांचा अभाव असतो,वाक्य समाप्ती दर्शविण्यासाठी कुठल्याही चिन्हाचा वापर नसतो,तसेच देवनागरी लिपीत वापरण्यात येणाऱ्या उभ्या रेषांचा
उपयोगही नसतो.
• वाक्यातील दुरुस्ती ही फुली मारण्यापेक्षा साधारणपणे चुकीच्या अक्षराखाली किंव्हा शब्दाखाली आडवीरेष मारून दर्शविली जाते.
•काही वारंवार येणाऱ्या शब्दांसाठी त्याचे संक्षिप्त रूप करून त्याचा लिखाणामध्ये उपयोग केला जातो.
•मोडो लिपीत शब्द न तोडता सलग लिहिला जातो.संपूर्ण शब्द मावत नसेल तरी त्याची जेवढी अक्षरे त्या ओळीत लिहिणे शक्य असेल तेवढी अक्षरे अक्षरशः कोंबलेली असतात.त्यामुळे तो
शब्द वाचकास माहित असणे फार गरजेचे असते.
मोडी लिपीचा काळ हा ९०० वर्षांपेक्षा जास्तचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा ९०० वर्षापासूनचा सगळा इतिहास मोडीत लिपीबद्ध केला गेला आहे.एवढा सम्रुद्ध इतिहास लाभलेल्या देशात तोच इतिहास अभ्यासुन लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाणकारांची कमतरता भासते आहे.आज पुण्यात 12 लाखांपेक्षा जास्त मोडी लिपीतील दस्तऐवज उपलब्ध आहेत पण त्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासासाठी त्यामानाने अभ्यासक कमी आहेत.असे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत कि ज्यांच्या जवळ जुनी मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत पण मोडीच्या अज्ञानाने तो अनमोल ठेवा दुर्लक्षित केल्या जात आहे.
इतकी वर्षे आपण आपल्याला शिकवला गेलेलाच इतिहास पुढच्या पिढीला शिकवत आलो आहोत पण अजूनही अंधारात असलेला इतिहासाचा अभ्यास करून तो नवीन पिढीला शिकवण्याच्या आपल्या कर्तव्याकडे कानाडोळा करण्याच्या वृत्तीने मोडी लिपीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आज आपण फक्त शिवरायांनी केलेल्या पराक्रमांबद्दल बोलतो,पण तो पराक्रम गाजविण्यासाठी त्यांनी कोणती आणि कशी तयारी केली,राज्यकारभार कसा सांभाळला,शिवरायांची राजनीती, युद्धनीती व न्यायनीती या विषयांचा अभ्यास व्हायला नको का?ह्या बद्दलची माहिती जगापुढे यायला नको का? इ.स.१९५६ मध्ये स्व.यशवंतराव चव्हाण यांनी मोडी जाणकारांना हे ऐतिहासीक दस्तावेज मोडी लिपीतून देवनागरी लिपीत लिप्यांतर करण्यासाठी खुले निमंत्रण दिले होते त्यावेळी त्यांना महाराष्ट्र सोडून इतर राज्यांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.ही मराठी म्हणवणारया साठी लाजिरवाणी गोष्ट होती पण त्याहीपेक्षा लाजिरवाणी गोष्ट म्हणजे जेव्हां त्यांना जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीच्या इतिहास विभागाकडून पत्र आले की ‘तुमच्याकडे मोडी लिपी वाचक नसतील तर आमच्याकडील कुशल लोक तुमच्या विनंतीवरून आम्ही पाठवू शकतो’.त्यावेळी मराठी जनतेला या जपानी लोकांचे फार कुतूहल वाटले पण स्वत:ची लाज वाटली नाही आणि आजही ती तशीच कायम आहे.फक्त तोंडानी "शिवाजी महाराजकी जय" म्हणुन फायद्याच नाही तर इतिहासाचा अभ्यास करून नवीन पैलु प्रकाशात आणण्यासाठी जिज्ञासु तरुण रक्ताने पुढे सरसावण्याची गरज आहे.जगातील सगळ्या गोष्टी ह्या नश्वर आहेत पण इतिहास हा तसाच टिकून राहणार आहे.आज जर आपण असेच हातावर हात ठेऊन बसून राहिलो तर ही ९०० वर्षांची कागदपत्रे नष्ट होऊन बराच अज्ञात इतिहास काळाच्या पडद्याआड नक्की जाईल व आपण संपूर्ण इतिहास समजून घेण्यापासून वंचित राहू.वाळवीच्या प्रादुर्भावामुळे वर्षाला हजारोनी पत्र जाळून टाकली जातात. म्हणजे ही आपली ऐतिहासीक अमुल्यवान संपत्ती आणि अप्रकाशित इतिहास कायमचाच नष्ट होत आहे की जो वर्तमान आणि भावी पिढीला कधीच कळणार नाही.
चीन पासून इटली पर्यंत, जपान पासून मेक्सिको पर्यंत सगळ्याच देशांना आपल्या भाषेचा आणि इतिहासाचा अभिमान आहे व तो जपण्याचा ते प्रयत्न करत असतात.२००८ च्या चीनमधील ऑलंपिकच्या उदघाटन सोहळ्यात चीनच्या पंतप्रधानांनी चीनी भाषेतच आपले भाषण केले होते.ऑलंपिकमधील उलटी मोजणी सुद्धा चीनी अंकातच होती. २ तास चाललेल्या उदघाटन सोहळ्यात त्यांनी चीनी संस्कृतीचं,इतिहासाचा प्रदर्शन केल.आज जर आपली संस्कृती,भाषा,लिपी,इतिहास जपायचा असेल तर पहिले त्याचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे.परंतु आपल्याच सरकार मधील एका वरिष्ट नेत्याने (कपिल सिब्बल),शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमातून देवनागरी अंकांना काढून त्यांच्या जागी इंग्रजी अंकांना प्राधान्य देण्याचा आदेश देऊन आपल्याला आपल्या भाषेबद्दल आणि इतिहास बद्दल किती कळकळ आहे हे दाखवुन दिले आहे.तेंव्हा अश्या सरकार कडुन आपण किती अपेक्षा करायची हे ज्याचे त्याने ठरवावे.
मोडी लिपीबद्दल आपल्याला माहिती असते पण ती नक्की कशी होती हे
आपल्यातल्या नव्या पिढीतील काहींना माहिती नसते. तिची तोंड ओळख करून
देण्याचा हा माझ्या अल्पमतीचा प्रयत्न. तज्ज्ञ यात अजून प्रकाश टाकतीलच.
मोडी ही एका अर्थाने मराठीची शॉर्ट हँड लिपी... खरं तर धावती लिपी ( रनिंग
लिपी) . प्रामुख्याने कारभारी मंडळी ही वापरत. सरकारी कागदपत्रे राजे लोक/
वरिष्ठ कारभारी सांगत अन हाताखालील कारकून ते मोडी लिपीत भराभर लिहून काढत.
शिवकाळापासून पेशवाई पर्यंतची बहुतांशी कागदपत्र मोडी लिपीत आहेत. मी एम.
ए. करताना त्यातली अनेक वाहीली, वाचली. त्या वेळेस शिकलेल्या मोडी लिपीवरची
थोडी माहिती आपणाशी शेअर करतेय.
ही मोडी लिपीतली बेसिक अक्षरे : पहिल्या ओळीत मोडी अक्षरे, त्याच्या खाली देवनागरी अक्षरे.

यातली शेवटच्या ओळीत मुदाहून ककाकीकुकेकैकोकौकंकः संपूर्ण लिहिली आहे.
त्यावरून समजेल की ही किती क्लिष्ट लिपी आहे ते... प्रत्येक अक्षर त्याच्या
आकार,इकार, उकार... इ. मध्ये बदलत जाते. त्यामुळे ही लिपी वाचणे अन
लिहिणेही अनोळख्याला खुप अवघड जाते... किंबहूना वाचायची नेहमी सवय असेल तरच
ती नीट वाचता येते.
तशात त्यातली काही अक्षरे अतिशय गोंधळात टाकणाती आहेत जसे कु आणि मु यात फार कमी फरक आहे. अशी अनेक अक्षरे आहेत.
तसेच ही लिपी एकाला जोडून एक अक्षरे लिहिली जात असल्याने अनेकदा दोन अक्षरे एकात एक मिसळून जातात. अन मग ती वाचणे अवघड होते.
तशात प्रत्येकाच्या अक्षरानुसार, त्याच्या वलणानुसारही ही लिपी बदलत जाते. उदा माझे आरती खोपकर हे नाव असे लिहिले जाईल :
अजून माहिती हळूहळू लिहीन.
चांगला मुद्दा आहे दिनेशदा...पण ह्या सुलभीकरणामुळेच ही इतकी चांगली लिपी नामशेष झाली... 
असो, त्यातल्या त्यात एक आनंदाची बाब म्हणजे मोडी फॉन्ट उपलब्ध आहे!!! सोमेशच्या ब्लॉगवरुन-ह्या दुव्यावरुन आपण डाऊनलोड करु शकतो.
मोडी लिपी शिकायची असेल तर ह्या संकेतस्थळाला भेट देता येईल.
तसेच मोडी लिपी, तिचा इतिहास, त्यातिल साहित्य, कलाकुसर इ. अनेक उपक्रम असणारे- थोडक्यात, 'मोडी' ला वाहिलेले हे संकेतस्थळ
मला वाटले होते, तेवढेही औदासिन्य नाहीये तर, ह्या लिपीबाबत
https://www.maayboli.com/node/22813?page=1
आपली मराठी भाषा फार पूर्वी 'मोडी' ह्या लिपीत लिहिली जायची.
मला प्रश्न असा पडलाय, की मोडी लिपी सोडून देवनागरीकडे आपण कसे काय वळलो? त्यामागची कारणे काय?
विकीपीडीयावर मराठी विषयी माहिती लिहितांना मराठी हा शब्द देवनागरी आणि मोडी अशा दोन्ही लिपींमधे लिहिलेला आहे.
तसेच लिपीच्या नष्ट होण्याविषयी माहिती लिहितांना तिच्यातल्या क्लिष्टतेमुळे छापतांना होणार्या गैरसोयीचे कारण दिलेले आहे.
मोडी विषयी अधिक माहिती इथे वाचता येईल.
हे सगळे वाचल्यानंतरही माझ्या मनात अनेक दिवस घोळत असलेल्या प्रश्नाचे नीट उत्तर मिळत नाहीये. कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावे. धन्यवाद.
देवनागरीने मोडीवर अतिक्रमण केले अशा काहीशा अर्थाची तुझी पोस्ट अथवा शन्का वाटते. (नसेल तर उत्तम)
वर अवलने लिहिल्याप्रमाणेच, मोडी ही देवनागरी ऐवजी, व त्या काळात बोरुने
हात न उचलावा लागता लिहीण्यास सोईची अशी विकसित केली गेली, तिच्यातही
कालानुरुप बदल घडले असतील सुधारणा झाल्या असतील.
तिचा "र्हास" वा वापरातुन नष्ट होण्यास छपाईसंबधातीलच कारण शक्य आहे.
ज्या काळात रोमन छपाई शक्य होउ लागली त्यानन्तर, अठराव्या शतकाच्या
मध्य/उत्तरार्धात, देवनागरीची (खास करुन संस्कृतकरता) छपाई शक्य होऊ लागली
(एक सहज सन्दर्भः १९०५-६ दरम्यान केव्हातरी सावरकरान्चे १८५७चे
स्वातन्त्र्यसमर या पुस्तकाचे हस्तलिखित जर्मनीमधे पाठवले होते, पण तेथिल
कामगारांस सन्स्कृत समजु शकत होते मराठी नाही, जरी लिपी देवनागरीच असली
तरी, त्यामुळे त्यान्ना ते भारतात छपाईसाठी पाठवावे लागले - यातिल नेमकी
मजकुर समजुन घेण्यातली तान्त्रिक अडचण अशा स्वरुपाची असू शकेल की मजकुर
पुर्वी माबोवर जसे रोमन मधे मराठी लिहिले जायचे तसे हस्तलिखित, व ते उच्चार
न समजल्यामुळे-अवगत नसल्यामुळे खिळे जुळणी अशक्य असे काहिसे).
याव्यतिरिक्त पेन्सिल / पेन वगैरेन्चा शोध आगामी काळात लागल्यावर बोरुने
लिहीण्याचे प्रमाण कमी झाले, व्यवहारात इन्ग्रजी आले, टाईपराईटर आला व
कालौघात मोडी लिपी "गरज सम्पल्याने" मागे पडली! माझ्या आईपर्यन्त, म्हणजे
स्वातन्त्र्यपूर्व काळात शाळातून मोडी शिकवली जायची, स्वतन्त्र देशात ते
देखिल मागे पडले, संस्कृत थोडीफार शिकवतात, सध्या देवनागरी शिकवतात हेच
नशिब म्हणायची वेळ आलीये, कारण आईबापच पाल्ल्यान्ना बिगारीपासून इन्ग्रजी
माध्यमात घालतात, तेव्हा हे सानी, अजुन पाचपन्चवीस वर्षानन्तर तुझी
मुले/नातु-पणतु, इथे मायबोलीवरच जर विचारू लागले की देवनागरी नाहिशी कशी
झाली तर त्याबद्दल मला आश्चर्य वाटणार नाही
कदाचित माझा नातु-पणतु तेव्हा उत्तर देऊ शकेल अशी अपेक्षा करतो 
असो, जोक्स अपार्ट, जुने कागदपत्र वाचायला मोडी शिकणे अपरिहार्य आहे, मी
आईकडून शिकलो नाही याचा खेद आहे, जर नाही शिकलो वा पुढील पिढ्यान्ना
शिकवली, तर नै नै तो "ब्रिगेडी इतिहास" आमच्या पुढच्या पिढ्यान्च्या नशिबी
येईल हे मात्र मी खात्रीने सान्गू शकतो!
मोडी ही आपली जुनी लिपी आहे. तू दिलेल्या माहितीप्रमाणे मोडी ही देवनागरीची "रनिंग लिपी" आहे. काही अक्षरं त्या दृष्टीने बदलली गेली - लिहिण्याची सोय म्हणून अन लिहिता लिहिता बदलत गेली. याचा अर्थ मोडीपासून बदलत गेलेली आणि त्यानुसार विकसित झालेली देवनागरी ही भाषा आहे, असा अर्थ होतो... मग हिंदी, संस्कृत आणि नेपाळी ह्या तीन भाषांबद्दल काय?
नेपाळी भाषेचा इतिहास पहाता ११ व्या शतकात ब्राह्मी पासून देवनागरी विकसित झाली आणि १२ व्या शतकापासून वापरात यायला सुरुवात झाली. (अधिक माहितीसाठी हे वाचा. )
याउलट, हिंदी ही भाषा देवनागरीत १९५६ सालापासून लिहिली जाऊ लागली. (अधिक माहितीसाठी हे वाचा. )
संस्कृत भाषेविषयी बोलायचे झाले, तर "भारताच्या ज्या ज्या प्रदेशात जी लिपी लोकांची मातृभाषा आहे त्या लिपीत संस्कृत भाषा लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखित अनेक भाषांत लिहिले जात असे; परंतु आता मात्र संस्कृतग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते." (अधिक माहितीसाठी हे वाचा. )
आता मराठीकडे वळूया.... मोडी ही १३ व्या शतकापासून २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची प्रमुख लेखनपद्धती होती. लिंबूदा म्हणाले, त्याप्रमाणे देवनागरीने मोडीवर अतिक्रमण केले अशा काहीशा अर्थाची माझी पोस्ट अथवा शंका वाटते आणि दूर्दैवाने ते खरं आहे!!!! आणि यातच माझ्या पोस्टचा मथितार्थ दडलेला आहे. मराठीतले सगळे जुने साहित्य, इतिहास ह्या लिपीत लिहिला गेला आहे. असे असतांना केवळ सोयीसाठी म्हणून आपण आपली ही लिपी सोडून दिली? इतक्या सहजपणे? लोकांनीही देवनागरी सहजपणे स्वीकारली का? की त्या काळात काही विरोधही झाला?
ही लिपीतल्या स्थित्यंतराच्या कालावधीतली प्रक्रिया काय आणि कशी होती, हे जाणून घेण्याचे मला कुतुहल आहे. दुसर्या एका धाग्यावर (इतिहासात कुणी आणि का रमावे?) सध्या चालू असलेल्या चर्चेत त्या धाग्याच्या लेखकाने मांडलेल्या एका मतानुसार जर प्रगल्भपणे इतिहासात डोकावले, तर हरकत नाही. म्हणूनच लिंबूदांनी वर लिहिलेले खरे होऊ नये, (तेव्हा हे सानी, अजुन पाचपन्चवीस वर्षानन्तर तुझी मुले/नातु-पणतु, इथे मायबोलीवरच जर विचारू लागले की देवनागरी नाहिशी कशी झाली तर त्याबद्दल मला आश्चर्य वाटणार नाही) म्हणून या विषयावर चर्चा व्हावी, हे माझे प्रामाणिक मत आहे.
कोणतीही भाषा ही माणसामाणसातल्या संवादाचे माध्यम असते आणि त्यावरुन निष्कारण वाद होऊ नये, हे तर खरेच आहे. परंतु, भाषेमुळे माणसाला एक ओळख मिळत असते, अशा ह्या भाषेला व्यक्त करणार्या लिपीसंदर्भात आपण उदासिन असू नये, ही एकच इच्छा. आपल्या ह्याच उदासिनतेमुळे जर आपण मोडी गमावून बसलो असलो, तर निदान तिच्या स्मृती तरी कधीतरी जागृत कराव्यात.... ती भाषा कशी होती? तिच्या अनुषंगाने आपल्या जुन्या पिढीतल्या लोकांच्या काय आठवणी होत्या? ती नामशेष होत असतांना कसे पडसाद उमटले, हे सगळे जाणून घ्यावे असे मला वाटते आहे. ह्याविषयी माहिती असणार्यांनी त्यावर जरुर प्रकाश टाकावा...
माझ्या आई/आज्जी, तसेच वडिलान्कडुन परम्परागत हेच शिकलो की देवनागरी
लिहीण्यास वेळ घेते म्हणून मोडी वापरात आली. देवनागरीने मोडीवर अतिक्रमण
केले वगैरे बाबी मला "लाल बावट्याचे शिन्तोडे" वाटतात 
माझे वडील त्यान्च्या प्रारम्भिक आयुष्यात काही काळ न.चि. केळकरान्कडे
लेखनिक म्हणूनही काम करित होते (अन अर्थातच त्यावेळच्या ब्राह्मणी
प्रथेनुसार त्यान्च्याकडे व इतर वेगवेगळ्या घरी "वारांवर" जेवायला असत).
शन्कराचार्यान्च्या मठात सात वर्षे राहून शिकलेली वेदविद्या व नन्तरच्या
काळात इन्ग्रजी शिक्षण यातुन त्यान्ना कधी कुठे हा साक्षात्कार झाला
नाही/कुणी घडवला नाही की देवनागरीने मोडीवर आक्रमण केले!
प्रत्यक्षात पाहू जाता छ्पाईचे कारण हेच सयुक्तिक वाटते, दिनेशदा, आजही
अप्पाबळवन्त चौकात मोडीलिपीच्या बाराखडीचे पुस्तक मिळते, माझ्याकडेही आहे,
पण ते तसे आहे म्हणजे १८५० च्या नन्तरच्या काळात, जेव्हा हे तंत्रज्ञानच
युरोपमधुन आयात होत होते, (जर्मन लोक तेव्हाही संस्कृत शिकत होती व
त्यान्ना संस्कृत उच्चार देवनागरीशी जोडता येत होते, मोडीशी नव्हे, याचाच
अर्थ परभाषीयान्ना शिकवायला देखिल त्या शतकातही देवनागरीच वापरली जात होती,
जसा वर पोथी वगैरेचा सरकारी लेखनीकाशी तुलना करण्याकरता उल्लेख झालाय) तर
त्यान्च्या सोईनुसार, मोडी ऐवजी देवनागरीस प्राधान्य मिळणे म्हणजे
देवनागरीने मोडीवर आक्रमण करणे असा होत नाही, तर इन्ग्रजी अंमलात मोडीकडे
(कदाचित जाणूनबुजुन वा सर्वदूर एक लिपी असावी अशा उद्देशाने) तुलनेत कमी
लक्ष पुरवले गेले. शिवाय, मूळात ब्राह्मी पासून देवनागरी वगैरे "विषय"
अनाकलनीयच आहेत, इतकेच होते, तर मग ब्राह्मी देखिल वापरातून नष्ट का झाली?
देवनागरीने आक्रमण केले? मग सध्या देवनागरी कोण वापरते? कोण पुरस्कर्ते?
असा सगळा रोख आहे या विषयाचा! असो.
मूळ तथ्य हेच की, मोडी लिपी ही काहीशी "इन्ग्रजी करता शॉर्टह्याण्ड" जशी
वापरली जाते, तशाच प्रकारे, पण बरीचशी कोणालाही वाचता येईल अशा प्रकारे
बनवलेली, जलद लिखाणाची लिपी होती, व ती देवनागरीपासूनच, देवनागरीनन्तर
सोईकरता बनवली गेली. कालौघात गरज न उरल्याने नष्ट झाली.
अन गरज उरली नाही म्हणजे काय तर, इन्ग्रजी अंमलात, हिन्दुस्थानी
सत्ताधार्यान्च्या आश्रयाने तगुन रहाण्यास राजेरजवाडेच उरले नाहीत, व जे
काय संस्थानिक होते त्यांस अधिकारही इतके नव्हते की रोजच्या रोज आज्ञापत्रे
(मोडीतुन) धाडावीत 
मात्र देवनागरीचे संवर्धन म्हणण्यापेक्षा "जतन" हे त्या त्या काळच्या
पोथ्यापन्डितान्नी चिकाटीने करुन ठेवले व त्याचाच परिपाक म्हणून पुढे
देवनागरी जशी पूर्वी होती तशीच टिकून राहिली. अन्यथा, मोडीवर देवनागरीने
आक्रमण केले का हा प्रश्न जो तुम्ही आज विचारताय, त्या ऐवजी, हाच सगळा
मजकुर तुम्ही रोमन लिपीत व कोणत्यातरी फ्रेन्च्/इन्ग्लिश भाषेत लिहीला
अस्तात व विचारले अस्तेत की भारतीय भाषा/लिप्या कुणाच्या प्रभावामुळे नष्ट
झाल्या? कदाचित हल्लीच्या "मनु" प्रमाणे वैदिक ज्ञानोपासना करणार्या
विशिष्ट "वर्गाला" त्याबद्दल दोषही दिला अस्तात.
असो, या बाबी म्हणजे जरी आत्याबाईला मिशा अस्त्या तर... च्या धर्तीचा
वाटतात. पण यातही तथ्य आहे, व तेच तथ्य मी "मोडीवर देवनागरीचे आक्रमण" या
विषयातून व्यक्त होणार्या-जाणवणार्या विषारी काट्याकडे वेधतो आहे.
जाताजाता: इ.स. १७८० च्या आसपास लोहगडावर नाना फडणवीसाने आमचे
घराण्यातील पूर्वजाचे द्वारे करवुन घेतलेल्या एका भल्या थोरल्या "बावे"
संदर्भात (विहीर) जो शिलालेख लिहीला आहे, तो देवनागरी मधेच आहे, मोडी मधे
नाही! याचाच अर्थ, वेळ घेऊन लिहावयाच्या वेळेस देवनागरी, व जलद
लिहावयाच्या वेळेस मोडी वापरात होती असा होत नाही का?
वर संस्कृत बद्दल एक उल्लेख आहे निरनिराळ्या स्थानिक लिप्यान्चा! तो खराही
आहे, मात्र...... आजही, देवनागरीमधुन वाचल्या/उच्चारल्या गेलेल्या वैदिक
संस्कृत साहित्याचे उच्चार हे अन्य कोणत्याही लिपीमधुन वाचल्या गेलेल्या
उच्चारांपेक्षा अधिक अचूक असतात, असे जाणकार सांगतातच, शिवाय कोकणातील
विशिष्ट वर्गाची वैदिक संस्कृत उच्चारणे ही सर्व भारतभर सर्वाधिक
अचूक्/शास्त्रशुद्ध मानली जातात. (कृपया यास कोर्टाप्रमाणे पुरावे वगैरे
मागू नयेत, माझ्याकडे पारम्पारिक माहितीव्यतिरिक्त नाहीयेत, पटले नाही तर
सोडून द्या, इतकेच)
ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोडी
|| श्री स्वामी समर्थ||
लोकहो,
या ब्लॉगावर मोडी लिपीत आम्ही लिहिलेला काही मजकूर प्रकाशित केला आणि चोखंदळ वाचकांनी मोडीबद्दल लिहा अशा सूचना केल्या. मोडी लिपीबद्दल आदर असलेला सुसंस्कृत आणि चोखंदळ वाचकवर्ग या ब्लॉगला लाभला, याचा आम्हांला फार आनंद आहे.
"मोडीबद्दल लिहा" हे आम्हांला सांगणे, म्हणजे "तुमच्या प्रेयसीबद्दल लिहा" हे सांगण्यासारखे आहे. कारण मोडी लिपीवर आम्ही प्रेयसीवर करावे तसे प्रेम करतो. त्यामुळे त्यांच्या या आग्रही मागणीची पूर्तता करण्यासाठी मोडी लिपीबद्दल हा लेख.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मोडी ही कुठलीही स्वतंत्र लिपी नाही. ही देवनागरीची उप-लिपी आहे. मोडी लिपीची जननी ही देवनागरीच आहे. जरी मोडीने गुजराती, कन्नड व बंगाली लिपीतील काही वर्ण घेतले असले तरी तिचा पाया हा देवनागरीचा आहे.
देवनागरी असतांना मोडी लिपी अस्तित्वात का आली?
याचे कारण असे की, देवनागरीत लिहितांना वेळ बराच वाया जातो. ही बाब पटो किंवा न पटो, पण हे वास्तव आहे. कारण प्रत्येक अक्षर सुटे लिहायचे, प्रत्येक शब्दावर शिरोरेघ मारायची, विरामचिन्हांचा वापर करायचा यामुळे लेखनाचा वेग मंदावतो.
मोडी लिपीचे जनक श्री. हेमाडपंत आहेत. त्यांचे नाव पंत हेमाद्री असे
होते. हे अत्यंत विद्वान आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे होते. ज्यावेळेस
यादवांचे साम्राज्य होते त्याकाळी राजा रामदेवराव यादवांच्या दरबारात ते
"करणाधिप" या हुद्यावर होते. राज्याच्या सर्व वसुलीचे कामकाज करणे,
राजकारणाबद्दल राजाला योग्य ती सल्लामसलत देणे, दरबाराचा सर्व पत्रव्यवहार
पाहणे हे त्यांचे काम होते. आजच्या युगात "चीफ सेक्रेटरी" ज्याला म्हणतात
तसा त्यांचा हुद्दा होता.
सहाजिकच त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार पहावा लागे. अशा वेळेस अशा एखाद्या लिपीची आवश्यकता त्यांना भासू लागली की ज्यात अत्यंत शीघ्रतेने कमीत कमी वेळात प्रचंड मजकूर लिहिता येईल. त्या गरजेपोटी त्यांनी मोडी लिपीची निर्मिती केली.
मोडी ही शीघ्रलिपी आहे. ज्याला इंग्रजीत रनिंग हॅण्ड म्हणतात तशी देवनागरीची रनिंग हॅण्ड म्हणजे मोडी.
अत्यंत शीघ्र गतीने लेखन हे जसे मोडीचे वैशिष्ट्य आहे तसेच अत्यंत सुंदर वळण हे ही तिचे वैशिष्ट्य आहे. मोडी लिपी दिसायला अतिशय सुंदर दिसते. तिचा स्वतःचा रूबाब आहे, तिच्यात नज़ाकत आहे.
आपल्या सर्वांचे पूर्वज मोडी लिपीतच लिहायचे. याचे कारण तेराव्या शतकापासून महाराष्ट्रात मोडी लिपी रुजलेली आहे. यादवकाळापासून ते शिवशाही, पेशवाई, परकीय राजवट, स्वातंत्र्यसंग्राम असे अनेक टप्पे या मोडी लिपीने पाहिलेले आहेत. छत्रपतींचा सर्व पत्रव्यवहार याच लिपीतून होत असे. सातशे वर्षांचा महाराष्ट्राचा इतिहास या लिपीमध्ये नोंदला गेलेला आहे.
सन १९५२ पर्यंत मोडी लिपी शालेय शिक्षणक्रमात होती. त्यानंतर त्यावेळच्या मूर्ख राजकारण्यांनी शिक्षणातून मोडी लिपी काढून टाकली. काही लोकांना असे वाटते की, ब्रिटीशांनी मोडी लिपी हद्दपार केली. पण तसे नाही. ब्रिटिश असतांनाही मोडी लिपी पूर्ण जोमात होती. अगदी ईस्ट इंडिया कंपनीचे पत्रव्यवहारही मोडी लिपीत होत असतं. १९४७ ला जेव्हा ब्रिटीश देश सोडून गेले त्यानंतर आलेल्या भारतीय राजकारण्यांचे हे १९५२ सालचे उपद्व्याप आहेत.
हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी म्हणून प्रादेशिक लिप्यांना नेस्तनाबूत करण्याचा एक व्यापक कट त्याकाळी शिजला होता असे म्हणतात. कारण हिंदी रुजवायची असेल तर देवनागरीच राहिली पाहिजे. मग देवनागरी सोडून इतर लिप्यांना उडवायचे. त्या हेतूने मोडी शिक्षणक्रमातून हद्दपार केली गेली असे मानणारा एक विद्वान वर्ग आहे, आणि त्यांचे हे म्हणणे पटण्यासारखे आहे.
मोडी लिपीचे सौंदर्य हा मोठा मनोरंजक आणि आल्हाददायक विषय आहे. मोडी लिपीतील प्रत्येक अक्षर हे लपेटीदार आहे. आणि अक्षरे जोडून लिहिली जातात त्यामुळे एखादी माळ गुंफल्यासारखी मोडी दिसते. तुम्हाला जे जे साधारण सत्तरी ओलांडलेले वृद्ध लोक माहित असतील, त्यांचे हस्ताक्षर पहा. त्या बहुतेकांचे हस्ताक्षर उत्तम असेल. तुम्ही या गोष्टीचे अवलोकन करा. आम्ही अनेक वृद्ध व्यक्तिंची हस्ताक्षरे पाहिली आहेत. ती अतिशय सुंदर आहेत.
आमचे आजोबा श्री. तात्यासाहेब आपटे यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर होते. याचे कारण हे की, हे लोक लहानपणापासून मोडीत लिहायचे. त्याकाळी मोडीचा कित्ता गिरवत असतं. त्यामुळे त्यांच्या अक्षरांना सुंदर वळण लागलेलं असे.
त्यानंतरची जी पिढी आली म्हणजे जे १९५२ नंतर शाळेत गेले त्या बहुतेकांची अक्षरे ही बिघडलेली दिसतील. अर्थात अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात. पण त्या पूर्वीच्या काळात खराब अक्षर असलेला एखादा सापडे, १९५२ नंतर चांगलं हस्ताक्षर असलेला एखादा सापडतो. अशा बहुतेकांचे हस्ताक्षर पाहिल्यावर तर आमच्या मनात,
" रांडेच्यान् काय लिहिलाय तेच कळत नाही" असा विचार येतो. याचे प्रमुख कारण हे की, त्या लोकांचा मोडीशी संबंध आला नाही.
मोडी लिपीची लेखन वैशिष्ट्ये:-
मोडी लिपी ही देवनागरीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. लिहिण्यापूर्वी ज्या शाईने आपण मजकूर लिहिणार त्या शाईने डावीकडून उजवीकडे एक ओळ आखून त्याखाली मोडी लिहिली जाते. प्रत्येक शब्दावर रेघ देण्याचा वेळ त्यामुळे वाचतो. तसेच पूर्वीच्याकाळी मोडी एकही शब्द आणि वाक्य न तोडता सलग लिहिली जात असे. त्यामुळे वाचणार्याच्या प्रज्ञेची कसोटी लागे.
म्हणून पूर्वी पत्रात, " लिहिणार्याचे वाचणार्यास दंडवत" असे लिहिण्याची प्रथा होती. कारण लेखन करणार्याने जे लिहिले आहे ते त्याच अर्थाने समजून घेण्याची बुद्धी वाचणार्याजवळ हवी.
नको तिथे वाक्य तोडून वाचले तर अनर्थ होईल. उदाहरणार्थ, आमचे एक मित्र आहेत कवी इलाही जमादार. त्यांच्या एखाद्या रचनेबद्दल लिहितांना, समजा असे लिहिले की,
कवी इलाही जमादार आहे.
हे वाक्य मोडीत लिहायचे तर ----- कवीइलाहीजमादारआहे ------ या पद्धतीने पूर्वी लिहिले गेले असते.
वाचणार्याने हे वाक्य नको तिथे तोडले तर --- कवी इला ही जमादार आहे --- असे वाचले जाईल आणि अनर्थ होईल. त्यामुळे मोडीत लेखन करणार्यापेक्षा, ते वाचणार्याच्या बुद्धीचा कस लागतो.
हल्ली मोडीत सुटे शब्द लिहिले जात असल्यामुळे मोडी बरीच "माणसाळलेय". नाहीतर पूर्वी मोडीला पिशाच्च लिपी म्हणत ते यामुळेच.
मोडीचे दुसरे वैशिष्ट्य हे की, मोडीत एक अक्षर अनेक प्रकारे लिहिले जाते. काही अक्षरे तर सहा सात पद्धतीने लिहिली जातात. इतकेच नव्हे तर नेहमीप्रमाणे डावीकडून उजवीकडे लिहिण्याऐवजी उजवीकडून डावीकडे लिहिली जातात. उदाहरणार्थ, 'च' हे अक्षर डावीकडून उजवीकडे जसे लिहिले जाते तसे उजवीकडून डावीकडेही लिहिले जाते. त्यात प्रत्येकाच्या "चॉईस" चा भाग आहे. आम्ही शक्यतो 'च' उजवीकडून डावीकडे लिहितो.
मोडीत 'र' अनेक प्रकारे लिहिला जातो. त्यात ज्या अक्षरांत बालबोध प्रमाणे काना असतो त्या कान्याला र जोडला जातो. त्यामुळे एका अक्षरात दोन अक्षरे लिहून होतात.
मोडीत काही अक्षरे अशी आहेत की ज्यात अत्यंत सूक्ष्म भेद किंवा प्रचंड
साम्य आहे. लेखन करतांना त्यांच्या वळणावर नीट लक्ष ठेऊन लिहावे लागते.
अक्षराचे वळण जरा चुकले की अनर्थ होतो. उदाहरणार्थ,
"कौलांवर पक्ष्यांचा थवा दिसत होता" या वाक्यात थ लिहितांना गडबड झाली आणि
थ चे वळण चुकले तर "कौलांवर पक्ष्यांचा खवा दिसत होता" असे वाचले जाईल.
त्यामुळे प्रत्येक अक्षराचे वळण नीट येईल ही काळजी घ्यावी लागते.
तसेच मोडीचा महत्त्वाचा भाग म्हणजे र्हस्व दीर्घाची भानगड मोडीत नाही. सर्व उकार हे र्हस्व आणि सर्व इकार दीर्घ. कितीही खटकलं तरी ते तसचं लिहायचं. लेखनाचा वेग महत्त्वाचा. बाकी विचार करायचा नाही. उदाहरणार्थ, कविवर्य राजा बडे यांची
चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.... ही ओळ मोडीत.... चांदणे शींपीत जाशी चालता तु चंचले...
अशीच लिहिली जाईल. किंवा सुरेश भटांची
दूर दूर तारकातं, बैसली पहाट न्हातं...... ही ओळ मोडीत.... दुर दुर तारकातं, बैसली पहाट न्हात....
अशीच लिहिली जाईल. किंवा
जिवलगा राहिले रे, दूर घर माझे... ही ओळ मोडीत.... जीवलगा राहीले रे, दुर घर माझे
अशीच लिहिली जाईल. तिथे र्हस्व-दीर्घाचा पर्यायच नाहीये. अशा लेखनामुळे वृत्ताची काशी झाली का? मात्रा चुकल्या का? या चौकशा करायच्या नाहीत.
अशी आहे मोडी
या महाराष्ट्राच्या इतिहासाची राखणदार बनून राहणारी, सातशे वर्षांचा इतिहास स्वतःमध्ये साठवून ठेवणारी, छत्रपतींची पत्रे सौभाग्यलेण्यासारखी मिरवणारी, तुकोबांच्या अजरामर अभंगाना स्वत:चे कोंदण बहाल करणारी, अत्यंत कमी वेळात लेखकाला भरपूर मजकूर लिहून देणारी, वाचणार्याच्या डोक्याचं खोबरं करणारी, विरामचिन्हे टाळणारी, सलग लेखनामुळे दुर्बोध ठरणारी, विविध लिपीतील वर्ण घेऊनही स्वत:ची मिजास दाखवणारी, लिहिणार्याला वरदहस्त देणारी, वाचणार्याला वेठीस धरणारी, शुद्धलेखनाचे कोणतेही नियम न पाळणारी, शब्दसंक्षेप वापरून लेखनाची गती वाढवणारी, अनेक शब्द चुकीच्या पद्धतीने लिहूनही त्याची खंत न बाळगणारी, शुद्धलेखनाचा आग्रह धरणार्यांना फाट्यावर मारणारी, तिची खडतर साधना आणि सराव करणार्यालाच वश होणारी, एकदा वश झाली की आयुष्यभर त्याला लेखनाचा निखळ आनंद देणारी..... आणि
स्वतःच्या सौंदर्याने पाहणार्याचे हृदय घायाळ करणारी, त्याच्या हृदयाचे सिंहासन काबीज करून त्याची मल्लिका बनणारी...
त्या मोडी लिपीला आणि तिचे जनक श्री. हेमाडपंत यांना आमचा दंडवत. मोडी नसती तर आम्ही कसे लिहिले असते? असा प्रश्न आम्हाला अनेकदा पडतो.
कारण मोडीने जी लेखनाची मजा दिली ती अन्य कुठल्याही लिपीने दिलेली नाही. तसेच मोडीचा पदर 'हाती लागल्यावर' आम्ही सुद्धा इतर कुठल्या लिपीचा 'दामन' हाती यावा अशी अपेक्षा केली नाही.
कारण ज्याला मोडी येते त्याला इतर कुठल्या लिपीत लिहावे असे वाटत नाही. उत्तम भोग हाती आला की दुय्यम भोग वृत्तीतून वजा होतो अशी मानवाचीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांची प्रवृत्ती आहे.
ज्यांच्या घरात मांजर आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा. भुकेल्या मांजराला दूध पोळी खायला द्या. ते आवडीने खातं. ते खात असतांना त्याच्या समोर पापलेट, सुरमई धरा. मांजर दूधपोळी सोडून पापलेटच्या मागे जातं. उत्तम भोग मिळाला की लगेच दुय्यम भोग वजा होतो.
किंवा एखादा कवी असतो. सुरूवातीस कविता लिहितो. मग त्याला गझल लिहायचे तंत्र साधतं. एकदा तो गझलेकडे वळला की बहुतकरून गझलच लिहितो. असे आहे.
मोडी आली की जे काही लिहाल ते मोडीतच यायला लागतं. म्हणूनच म्हणावसं वाटतं,
ज्याला लिहिता आली मोडी... त्याला कळली लेखनातली गोडी
आपला,
(मोडीप्रेमी) धोंडोपंत
मोडी शिकवण्याची पद्धत
अशी असेल मोडी शिकवण्याची पद्धत
नमस्कार,
आमच्या पहिल्या पोस्टला दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण दाखवलेला उत्साह हा आमचा उत्साह वाढवणार आहे. या ब्लाॅगद्वारे मोडी कशी शिकणार असा प्रश्न अनेकांच्या मनात निश्चित आला असेल. पण मी आणि माझ्यासारखे अनेक जण ज्या पद्धतीने मोडी लिपी शिकले, नेमकी तीच पद्धत आम्ही इथे वापरणार आहोत.
या नंतरच्या एक-दोन पोस्टमध्ये मोडी लिपीचा इतिहास, त्याचा वापर, मोडी लेखनाचे विविध काळ, याची माहिती असेल. लगेचच आम्ही मराठी आणि मोडीची बाराखडी या ब्लाॅगवर अपडेट करु. या दोन्ही बाराखड्या डाऊनलोड करुन तुम्हाला हाताशी ठेवता येतील. या टप्प्यानंतर दृकश्राव्य (Audio Visual) स्वरुपात प्रत्यक्ष बाराखडी कशी काढावी हे दाखवले जाईल. याचे सर्वसाधारण पाच भाग असतील. ही बाराखडी कोण शिकवणार हे तूर्तास सांगत नाही. पण जे मान्यवर ही बाराखडी शिकवणार आहेत, त्यांचा या क्षेत्रातला अनुभव मोठा आहे, एवढेच आत्ता सांगतो. ज्यांना मराठी बाराखडीची ओळख, उजळणी करायची आहे, त्यांनाही याचा उपयोग निश्चित होईल.
मोडी लेखनाचा महत्त्वाचा भा्ग असलेली कालगणना आणि रेघी हिशेब याचीही सविस्तर माहिती ब्लाॅगद्वारे दिली जाईल. ती लिखित स्वरुपात आणि दृकश्राव्य स्वरुपातही असेल.
पुढे सरावासाठी काही पाठ आम्ही अपडेट करु. त्यात सरावासाठी कुठली पुस्तके वाचायची, ती कोठून मागवायची याची माहिती आणि लिंक्स आम्ही देऊ. आमचे ई-मेलही आम्ही शेअर करणार असून सरावासाठी तुम्ही केलेले लेेखन तुम्ही आम्हाला स्कॅन करुन पाठवू शकता. पुढच्या टप्प्यात ब्लाॅगच्या माध्यमातून सोपी ऐतिहासिक मोडी कागदपत्रे सरावासाठी उपलब्ध करुन दिली जातील. त्याचबरोबर काही संस्थांच्या वेब-साईटच्या लिंक्सही आम्ही देणार आहोत. या संस्थांच्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला मोडी कागदपत्रे वाचायला मिळतीलच शिवाय काही ऐतिहासिक महत्त्वाची पुस्तकेही पीडीएफ (PDF) तुम्ही वाचू शकाल.
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
चला तर मग...भेटूया नव्या पोस्टसह..
ता. क. - खाली दिलेला लेखन सीमा असे लिहिलेला शिक्का हा मोडी कागदपत्रात लिखित मजकुराच्या शेवटी आढळतो. मजकुराचे किंवा पत्राचे लेखन संपल्याचे दर्शविणारा हा शिक्का आहे.
इतिहास मोडी लिपीचा भाग- 2
- बऱ्याच मोडी अक्षरांचे उकार हे अक्षराच्या पुढे जोडलेले असतात
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
मोडी का शिकायची?
आज या साऱ्या कागदपत्रांचा खजिना विविध संस्था, सरकारी कचेऱ्यांमध्ये रुमालांमध्ये बंद आहे. हा खजिना मोडी लिपी वाचू शकणाऱ्यांची प्रतिक्षा करतो आहे. मोडी लिपी का शिकायची यासाठी उदाहरणादाखल काही लिंक्स खाली देत आहे. त्या जरुर वाचाव्यात ही विनंती.
(सोमवारी याच ब्लाॅगवर मराठी बाराखडी देत आहोत. मोडी शिकण्यापूर्वी मराठी बाराखडी जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणानंतर अनेकजण बाराखडी विसरलेले असतात असा अऩुभव आहे. त्यामुळे या निमित्ताने या बाराखडीची उजळणीही होईल)
कृपया खालील लिंक्स जरुर पहा
मोडी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
मराठी बाराखडी
मोडी शिकण्यासाठी प्रथम मराठी बाराखडी नीट माहिती असणे आवश्यक आहे. कारण मोडी ही मराठीचीच लिपी आहे. शालेय जीवनात एकदा बाराखडी शिकलो की मग तिचा आणि आपला थेट संबंध रहात नाही. हे विधान सर्वसाधारण नसले तरीही अऩेकांना मराठीची बाराखडी येत नाही, किंवा कुठल्या क्रमाने अक्षरे येतात हे सांगता येत नाही. त्यामुळे मोडी लिपीची बाराखडी देण्याच्या अगोदरचे एक पाऊल म्हणजे मराठी बाराखडी डोळ्यांसमोर आणणे. मोडी बाराखडी देण्यापूर्वी आम्ही आपणासाठी मराठी बाराखडी देत आहोत.आम्ही मोडी बाराखडी दिली की मग मराठी बाराखडी समोर ठेऊन मोडी बाराखडी लिहिण्याचा सराव करता येईल.
बाराखडी पीडीएफ डाऊनलोड-
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
मोडी वर्णमाला
ही वर्णमाला या क्रमाने आहे-
मोडी वर्णमाला pdf download-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZVFE1ZW1SN0VTVDQ/view?usp=sharing
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
मोडी लिपी प्रशिक्षण- भाग 1
मोडी लिपी शिकण्याच्या प्रक्रियेतल्या पुढच्या टप्प्यावर आपण जात आहोत. आधी सांगितल्यानुसार आता हे प्रशिक्षण कोण देणार हे स्पष्ट करतो. पुण्यातले इतिहासाचे अभ्यासक आणि मोडीचे तज्ज्ञ श्री. मंदार लवाटे आपणास मोडी लिपी शिकवणार आहेत. श्री. लवाटे दशकाहून अधिक वर्षे मोडी लिपीचा अभ्यास करत आहेत. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात श्री. लवाटे मोडी कागदांचा अभ्यास करतात. पुण्याचा इतिहास, पुण्याच्या गणेशोत्सवाचा इतिहास याचा श्री. लवाटे यांचा मोठा अभ्यास आहे. आता खालील व्हिडिओमध्ये आपण श्री. मंदार लवाटे यांच्याकडून मोडी लिपीची माहिती, ती शिकण्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत....
प्रशिक्षणाचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/user/amitsg1
मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 2 - बाराखडी क ते ङ
https://youtu.be/KU7oBcb9TLw
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_Zc2VKbGU4QnRyYkk/view?usp=sharing
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 3- बाराखडी च ते ञ
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZYmZfeWxqbUdfY2s/view?usp=sharing
आधीच्या पाठात दिलेल्या क ते ग या बाराखडीचा सराव सुरु ठेवा. रोज किमान पाच वेळा ही बाराखडी लिहिलीत तर ती लवकर आत्मसात होईल. चला तर मग आता शिकूया बाराखडीचा पुढचा भाग च ते ञ -
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येतील -
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
मोडी लिपी प्रशिक्षण भाग- 4- बाराखडी ट ते ण
ट ते ण ही बाराखडी शिकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
या संपूर्ण प्रशिक्षणाचे व्हिडिओ पाहण्य़ासाठी या लिंकवर क्लिक करा-
https://www.youtube.com/watch?v=JYhMyUNqsFQ&list=PLCMSpB6v_YetSEcc3QTVZheNinIJa3iBB
ड ते ण ही बाराखडी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक उपयोगी पडेल-
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZeE5lUWo0alJNVVU/view?usp=sharing
आपणा सर्वांना नम्र विनंती. वरच्या लिंक आपापल्या फेसबुक, ट्विटर, ई-मेलवरुन जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा. अधिकाधिक लोकांनी मोडी लिपी शिकावी हीच आमची इच्छा आहे.
मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 5 - बाराखडी त ते न
मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 6 - बाराखडी प ते म
प, फ, ब, भ, म या अक्षरांची बाराखडी सरावासाठी खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्या
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZT0RXVnYtMlE4Qmc/view?usp=sharing
मोडी लिपी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ आपल्याला इथे पाहता येतील -
https://www.youtube.com/user/amitsg1
कृपया या उपक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपल्या प्रतिक्रिया खालील ई-मेलवर पाठवल्यास आम्ही उपकृत राहू
मंदार लवाटे -
lawate@gmail.com
अमित गोळवलकर -
gamits@gmail.com
मोडी लिपी प्रशिक्षण भाग- 7- बाराखडी य ते ष
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZamZKWVFVcUVVdzA/view?usp=sharing
मोडी प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ आपल्याला खालील लिंकवर मिळतील -
https://www.youtube.com/user/amitsg1
मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 8 - बाराखडी स ते ज्ञ
स ते ज्ञ ही मोडी लिपी व्यंजने कशी लिहिली जातात हे खालील व्हिडिओवरुन आपण शिकू शकता
https://www.youtube.com/user/amitsg1
मोडी लिपी बाराखडी संपूर्ण
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZQm5CQ2J0WGJPUlE/view?usp=sharing
या मोडी अक्षरांची वळणे कशी आहेत हे मंदार लवाटे युट्यूबच्या माध्यमातून शिकवत आहेत. त्यासाठी खालील लिंकवर जाऊन आमच्या आॅनलाईन प्रशिक्षण वर्गाला जरुर भेट द्या.
https://www.youtube.com/user/amitsg1
मोडी स्वर आणि मोडी लिपीतली समान दिसणारी अक्षरे याचा पाठ आम्ही युट्युबर लवकरच अपलोड करत आहोत. त्यासाठी या ब्लाॅगला आणि युट्यूबवरच्या प्रशिक्षण वर्गाला आवर्जून भेट द्या. आपल्या प्रतिक्रीयाही आम्हाला हव्या आहेत. त्याही खालील ई-मेलवर जरुर पाठवा
gamits@gmail.com
सरावासाठी सोपी अक्षरे
ही फाईल खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घेता येईल
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZZDhEbFNHLXdwZUk/view?usp=sharing
प्रशिक्षणाचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी -
https://www.youtube.com/channel/UCBA_F-UIqMsp__bd2DLE_Tg
या युट्यूब लिंकवर क्लिक करा
मोडी सोपे शब्द भाग 2
ही फाईल खालील लिंकवरुन डाऊनलोड करुन घेता येईल.
https://drive.google.com/file/d/0Bxla3B7ilu_ZX1B3Z3poVk8xYWs/view?usp=sharing
मोडी लिपी प्रशिक्षण भाग - 9 - बाराखडी अ ते अः
मोडी लिपीची व्यंजने आपण शिकत असाल. त्यांचा सरावही झाला असेल. बऱ्याच विलंबानंतर मोडी लिपीचे स्वर नव्या व्हिडिओद्वारे देत आहोत. मध्यंतरी काही कामामुळे स्वर शिकविण्यास विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व. आता आपण श्री. मंदार लवाटे यांच्याकडून मोडी लिपीचे स्वर शिकुयात. खालील व्हिडिओवरुन आपण मोडी स्वर शिकू शकता
https://www.youtube.com/channel/UCBA_F-UIqMsp__bd2DLE_Tg
मोडी लिपीतले वेगळे उकार
मोडी लिपीची माहिती आणि सुरवातीपासूनची बाराखडी शिकण्यासाठी भेट द्या
https://www.youtube.com/channel/UCBA_F-UIqMsp__bd2DLE_Tg
मोडी लिपी आणि फारसी शब्द
- आपलाच
इतिहासातील महत्वाच्या व्यक्तींचे शिक्के | व्यक्तीची ओळख त्याच्या शिक्क्यावरून होते...
| मुद्रा |
छत्रपती शिवरायांची राजमुद्रा
प्रतिपच्चंद्र
लेखेव वर्धिष्णुर्वि श्व वंदिता | शाहसु
नोः शिवस्यैषा मुद्रा
भद्राय राजते।
छत्रपती संभाजी महाराजांचा शिक्का
श्री शंभो:
शिव जातस्य मुद्राद्यो
रिव राजते यदं
सो विनो लेखा वर्तते कस्य नी
परि
छत्रपती राजाराम महाराजांच शिक्का
श्री धर्म प्र
द्योतितां शेषव
र्णा दाशरथेरिव
राजारामस्य मुद्रे
यं विश्ववंद्या
विराजते।
छत्रपती शाहू महाराजांचा शिक्का
श्री
वर्धिष्णुर्विक्रमै विष्णो
सा मूर्तिरिव वामनी
शंभु सुनो रिव
मुद्रा शिवराजस्य
राजते ।।
छत्रपती शाहू महाराजांचा सरदेशमुखीचा शिक्का
स्वस्ती श्री सुखदा
मुद्रा प्रतापोत्कर्ष
वर्द्धिनी ॥ सरदेश
मुखस्येषा शाहू
राजस्व राजते
पेशव्यांचे शिक्के
मोरोपंत पिंगळे
शिवचरणी तत्पर
त्र्यंबकसुत
मोरेश्वर
बाळाजी विश्वनाथ
श्री
श्री उमाकान्त
पदाभोजा भजना
प्रमुन्नते: बाळाजी
विश्वनाथस्य मुद्रा
विजयहेतराम।
थोरले बाजीराव
१)
श्री.
राजा शाहू
नरपति हर्षनि
धान बाजीराव
बलाल प्रधा
न
२)
श्री
राजा शाहू
नरपति ह
र्षनिधान विश्व
नाथ सुत बला
ळ प्रधान
नानासाहेब पेशवे
१)
श्री
राजाराम नर
पती हर्ष निधान
बाळाजी बाजी
राव प्रधान२)
श्री
राजा शाहू नर
पति हर्षनिधान
बाळाजी बाजी
राव प्रधान
रघुनाथराव उर्फ राघोबा
श्री सांब
सपुत्रो विजयते राजा
शाहू नरपति हर्षनिधा
न रघुनाथ बाजीराव
मुख्य प्रधान
थोरले माधवराव पेशवे
श्री
राजाराम
नरपति माधव
राव बलाल
प्रधान
सवाई माधवराव
श्री
राजा शाहू नर
पति हर्ष निधा
न माधवराव ना
रायण मुख्य
प्रधान
दुसरा बाजीराव
श्री
राजा शाहू नरप
ति हर्ष निधान बाजी
राव रघुनाथ मु
ख्य प्रधान
कांही सरदारांचे शिक्के
धनाजी जाधव सेनापती
श्री
राजाराम चरणी दृढभा
व सेनापति ध
नाजी जाध
व राव
कान्होजी आंग्रे सरखेल
श्री
शाहू नृपती प्रीत्या
तुकोजी तनुजन्मनः का
न्होजी सरखेलस्य मुद्रा
जयति सर्वदा
पिलाजी जाधव
श्री पांडुरंग
चरणी दृढभाव
चांगोजी सुत
पिलाजी जाधव
दमाजी गायकवाड सेनाखासखेल
श्री राजाराम छ
त्रपति अखिल प्रौढप्रता
प पुरंदर दमाजी गाये
कवाड सेनाखासखेल
समसेर बहादर
जानोजी भोसले
श्री
श्री शाहूरा
ज पदांभीजभ्रम
रायित चेतसः बि
बात्मज समुद्रे
षा राघवस्य
विराजते
साबाजी भोसले
श्री
रघुविर च
रणी तत्पर सा
बाजी भोसले निरंतर
खंडेराव दरेकर सरलष्कर
श्री
चरणी तत्पर
जयाजीसुत खंडेराव
दरेकर सरलष्कर
मुरारराव घोरपडे
श्री च
रण भजन तत्पर
तत्सुत मुरारजी घोरपडे
निरंतर
महादजी शिंदे
श्री ज्योतिस्वरूप चरणी
तत्पर राणोजीसुत
महादजि सिदे निरतर
दौलतराव शिंदे
श्री जोतिस्वरूप च
रणी तत्पर महाद
जी सुत दवलतरा
व शिदे निरत
र
मल्हारराव होळकर
श्री म्हाळसा
कांत चरणी
त पर खंडोजी सुत
मल्हारजी हो
ळकर
प्रतिनिधी
श्री आई आदि पुरुष
श्री राजा शाहू छत्र
पति स्वामी कृपा
निधितस्य परशराम
त्र्यंबक प्रतिनिधी
ऐतिहासिक पत्रातील रेघांचे देखील असतात प्रकार | जाणून घ्या त्यांची नावे आणि वापरण्याच्या पद्धती
मोडी लिपीत पत्र लिहायचे म्हणजे आधी रेघ मारायची हा शिरस्ता किंवा पद्धत आहे. सुरवातीची रेघ आपण कशी काढतो यावरून त्याचा प्रकार आणि कोणता हुद्दा असणाऱ्या व्यक्तीला संबोधित करते याचा अंदाज लागतो. सुरवातीची रेघ नक्की कोठे तोडतो त्यावरून परत मायना ठरतो आणि त्या अनुषंगाने पत्राचे वजन लक्षात येते, ज्या व्यक्तीस पत्र लिहिले आहे ती व्यक्ती किती महत्वपूर्ण आहे हे ही समजते.
शिवरायांच्या काळात वापरल्या जाणाऱ्या मोडी लिपी विषयी मनोरंजक गोष्टी येथे वाचा
खाली दिलेला फोटो पाहून आपणाला रेघ तोडण्याची कल्पना येईल
| Image source: Sadhan Chikitsa |
एकाहून अधिक व्यक्तींना उद्देशून पत्र असेल तेव्हा त्यांच्या दर्जानुरूप मामलेदार, कमावीसदार देशमुख, पाटील, कुलकर्णी, नाडगौडा, बारा बलुतेदार अशी नावे येतात. ज्याला पत्र पाठवायचे त्याचे वय, दर्जा, संबंध लक्षात घेऊन निरनिराळे मायने कागदपत्रातून येतात. दंडवत, विज्ञापना, आशीर्वाद, गोसावी, तीर्थरूप, राजमान्य राजश्री, वज्रचुडेमंडीत, गंगाजलनिर्मल, चरणरज इ. शब्दात पत्रग्राहक वा प्रेषक आपला परिचय करून देत असे. ब्राह्मणाला इतर जातीच्या लेखकाने दंडवत लिहावा. अब्राह्मण व्यक्तीनी ब्राह्मणास रामराम लिहावा असा संकेत होता व तो काटेकोरपणे पाळलाही जात असे. सेवकाने वा आश्रिताने मालकास स्वामी, गोसावी या शब्दात गौरवून स्वतःस सेवक, पोष्य, चरणरज संबोधावे असा सामान्यपणे प्रघात दिसतो.
कागदाची घडी घालून त्याचे चार समान भाग करतात त्याला कागद मोडणे म्हणू. कागद मोडल्या वर श्रीकाराच्या खालील पहिली ओळ किती तऱ्हेनें काढता येते तें पहा. कागद उजव्या बाजूनें मोडून त्याचे चार रकाने पडतात.
शिवकाळात पत्र नक्की कोणत्या कारणास्तव लिहिले त्यावरून त्याचे ८४ प्रकार पडतात ते येथे जाणून घ्या
रेघ चारही रकाने ओढली म्हणजे तीस 'सबंध रेघ' म्हणतात. तीत पहिल्या रकान्यांत एका अक्षराची जागा कोरी ठेवली म्हणजे तिला 'दफे रेघ' म्हणतात; दोन अक्षरांची ठेविली म्हणजे 'दफाते रेघ' म्हणतात; तीन अक्षरांची ठेविली म्हणजे 'कर्ते रेघ' म्हणतात; चार अक्षरांची ठेविली म्हणजे 'महजर रेघ' म्हणतात. पहिल्या दोन रकान्यापुरतीच तेवढी रेघ ओढली म्हणजे तीस पहिली 'जिल्हे रेघ' म्हणतात. नुसत्या तिसऱ्या व चवथ्या रकान्यापुरतीच रेघ ओढली व पहिले दोन रकाने मोकळे ठेविले म्हणजे त्या रेघेस 'दुसरी जिल्हे रेघ' म्हणतात. मधला दुसरा व तिसरा असे दोन्ही रकाने भरून शिवाय पहिल्या व चवथ्या रकान्यांतील दोन दोन अक्षरांची जागा घेऊन रेघ ओढली म्हणजे त्या रेघेला 'बीत रेघ' म्हणून संज्ञा आहे. ह्याच बीत रेघेस अकार प्रारंभी लावला म्हणजे त्या रेघेला 'अज् रेघ' म्हणण्याचा संप्रदाय आहे; एकार लाविला म्हणजे 'एकुण हत् रेघ' म्हणतात. बाक देऊन बीत रेघेचा प्रारंभ केल्यास 'वासलात् रेघ' म्हणण्याच परिपाठ आहे. मायन्याची पहिली रेघ ओढण्याचे कारणपरत्वें इतके प्रकार आहेत. ह्या सर्व प्रकारांहून आणिक तीन प्रकारची रेघ आहे. रेघेच्या प्रारंभी दकार काढला म्हणजे 'दकारी रेघ' सिद्ध होते.
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी 'मेस्तक पुस्तक' प्रसिध्द केले त्यात खालील उतारा दिला आहे ज्यातून रेघ कोठे तोडायची आणि त्या तोडलेल्या रेघांची नावे काय आहेत हे समजते.
"कागद करोनि वर्ख । निक सव्यें मोडावे कौतुकें । च्यारी रकाने नेटके । समान करावे ॥३०॥ चहूं माजि विभागता । नांवें सांगेन ऐक आतां । पहिला रकाना म्हणतां । येक चि जाणिजे ॥३१॥ रकाने दोनि लिहिजेति । जिलेहे ऐसें तयाशि म्हणति । तीन रकाने जैं सांपडति । तैं मशूदर ||३२|| मधील दोनि लिहिजेती । तैं बिंति ऐसें तया म्हणती । त्यांत अर्धार्ध सांडिती । तैं तैनेतं ॥३३॥ त्यांत हि सांडिती दोहींकडे । मध्यें दोनि अक्षरें लिहिणे घडे । तैंकिर्दार म्हणतां आवडे | शेणवयासि ||३४|| येणे चि माने जिल्हेचा । विभाग नेमिला साचा । बिंतबिंतनचा। तपसील निका ॥३५॥ रकाना मोईन अक्षरें च्यारी । सांडूनियेका || अक्षराची वारी । रेखा वोढिजे मशूदरी । तैं हर्फ जाणिजे ॥३६॥ टाकितां अर्धा रकाना । दफाते दफात म्हणती विचक्षणा । जाणोनि ऐशिया मना लेखन कीजे || ३७ || पुढील सांडता रकाना । मागील तीनि रकाने विचक्षणा । हमंदर लिहिती लेखना। आर्दासा व किताबती ॥३८ च्यारी रकाने कायती । शरायनी जीस लिहिती । जीणे न्यून पूर्ण पुरे पडती । कागद देखा ॥३९॥
शिवकालीन पत्रातील खाचाखुणा जाणून घ्या
रेघ कुठे तोडतो याप्रमाणे तोडलेल्या रेघेच्या आधी कोणता शब्द अथवा कोणती आकृती काढावी जेणेकरून पत्राचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी हेमाडपंत खालीलप्रमाणे सांगतात
खं ब्रह्म निर्गुणं प्रोक्तं रेषे हरिहरद्वयोः ।
दकारेण स्नेहमाप्नोति; ताबलक्ष्मीः स्थिरा भवेत् ॥
म्हणजेच रेघेच्या आधी शून्य काढला की ब्रम्हाचा निर्देश होतो, दोन उभ्या रेघा काढल्या की हरिहराचा उल्लेख होतो व दकार काढला की मित्रत्वाचा आविष्कार होतो.
मित्राणां त्रितया रेषा द्वे भृतस्य रिपोरपी।
षड्गुरो : स्वामिन पंच एकैकं पुत्रकन्यो ।
अर्थात, मित्रासाठी तीन रेषा, दोन रेषा सेवक आणि शत्रूसाठी, सहा रेषा गुरुसाठी. पाच रेषा मालकासाठी आणि कन्या, पुत्र यांचेसाठी प्रत्येकी एक रेघ काढावी.
१. जातपाटील वगैरेंना पत्रे लिहताना 'ताा' ( तहां ) म्हणोन लिहीत
२. खिजमतगारांस माा ( मशहुरल ) असे लिहिले जाई.
अ) दकारी व तीन-रकानी छत्रपतींचीं पत्रे जमीदार देशमुख देशपांडे यांस मशरूल अनाम म्हणोन
आ) बीतरेघी पत्रे ब्राह्मण, गोसावी, बैरागी, भिक्षुक, पंडित यांनी लिहिली जात
शिवकालीन कालगणना नक्की कशी होती ते जाणून घ्या
इ) पदाधिकारी संस्थानिकांस मथळ्यावरील श्रीच्याखालीं बीतरेघ काढून 'सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य' येथपर्यत दकारपूर्वक लेहून, नंतर राजश्रीच्या पुढे जसें ज्याचें बैभव तशी कमीजास्त जागा सोडून, नांव, आडनांव, मरातब लेहून 'गोसावी यांसि' काढून पहिल्या किंवा दुसऱ्या जिल्हेंत दुसरी ओळ पुरी करावी. तिसऱ्या तीन-रकानी ओळींत स्ने|| आपले नांव रामरामपूर्वक घालावें.
१) शिलेदार, बारगीर नामधारक, हषमलोक मानकरी, सर्व शूद्रपरस्परें, किल्लेकरी, हवालदार, कारकून अखंडित पासून मायना काढून बीतरेघ व एक जिल्हा एवढ्यांत मायना आटपीत असत.
२) श्रीनजीक दोन-रकानी रेघेत 'राजश्री आडनांव गोसावी यांसि' येवढा मजकूर घालून, नंतर चौरकानीत स्नेहांकित म्हणोन मजकूर जमीदार, ठाणेदार वगैरे कनिष्ठ नोकरांना लिहीत.
३) सामान्य शूद्रांस डावेकडील कागदाचा रकाना एक टाकून तीन रकाने योग्यतेनुरूप लिहीत.
४) महजर, चकनामे, खरीदपत्रें वगैरे सर्व सरकारी कागद चार रकानी रेघेंत सुरू होत.
| हुद्द्यानुसार दकार व ईकार वापरण्याची पद्धत |
ऐतिहासिक पत्रांचे ८४ प्रकार, माहिती करून घ्या येथे
ऐतिहासिक पत्रे म्हणजे तत्कालीन समाजव्यवस्थेचा आरसा. ढोबळ मानाने कोणत्याही पत्रांचे दोन प्रकार पडतात
अ.) खाजगी पत्रे
ब.) सरकारी पत्रे
याखेरीज पत्र नक्की कोणत्या कारणास्तव लिहिले आहे त्यावरून त्याचे प्रकार पडतात.
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांनी या पत्रांचे जे प्रकार दिले आहेत ते खालीलप्रमाणे आहेत.
१. अभयपत्र - दहशतीनें परांगदा झालेल्यास परत आणण्याबद्दल लिहावयाचें ते
२. अमानत किंवा जतीपत्र - एक वादी भोगवटा करतो, दुसरा फिर्याद आला, सबब लिहिलें तें.
३. अर्जीइनामपत्र- नजर देऊन इनाम घेणें तें.
४. आमंत्रणपत्रिका - दरबारांत बोलाविलें ती.
५. आज्ञापत्र - छत्रपतीचें खुद्द पत्र तें.
६. इनामपत्र - धन्यांनी कृपा करून जमीन अगर गांव देणें त्याबद्दलचें.
७. कबजपत्र - कबजा दिल्हा तें.
शिवकालीन पत्रातील मजेशीर गोष्टी येथे वाचा
८. कबुलायत- ठराव करून लिहून घेणें ती.
९. कर्जरोखा- रिणकोनाम लिहून घेणें तो.
१०. करीना-बादी यांची हकीकत लिहून घेणें तो.
११. कुंकुमपत्र - लग्न - मुंजीचें पत्र तें.
१२. कुंठितपत्र – कलमाकलमास लबाडी दिसून आली सबब यापरतें बोलणें नाहीं म्हणोन लिहून घेणें तें.
१३. कौलनामा - रयतेस इस्ताबा देऊन लावणी अगर बसाइत करण्यासाठीं जें पत्र लिहून देणें तें.
१४. खरेदीपत्र - खरेदी जमीन वगैरे घेतलें तें.
१५. खोका - हुंडीवर भरपाई लेहून घेतली, ठिकाणीं हुंडीचा ऐवज पावला न पावला, चौकशी केली तरी दाखविणें तो.
१६. खोटपत्र - कलमा कलमाची पुरवणी पांढरमुखें झाली नाहीं. खोटा पडला. नंतर लिहून घेणें तें.
१७. गुन्हेगारी किंवा दंडपत्र- न्यायी खोटा झाला त्यापासोन द्रव्य घेणें त्याचें पत्र तें.
१८. जातकतबा किंवा मोकदमजामीनकतबा- जातीस जामीन मोकदमास घेणें तो.
१९. जातपत्र - आपण लिहून देणें तें.
२०. जन्म टिपण- जन्मतां केलें तें.
२१. जप्तीचिट्टी- जप्ती करविली ती.
संपूर्ण हिंदू कालगणना सोप्या भाषेत सजून घ्या
२२. जसीपत्र - एक वादी भोगवटा करतो, दुसरा फिर्याद आला, सबब लिहिलें तें.
२३. जाब - हुंडी गमावली पुन्हां लिहून घेणें तो.
२४. जामीनसाखळी - रयतेस एकमेकांस जामीन घेणें ती.
२५. जामीनी- ऐवज कुळाकडून येणें थकला, त्यास तगादा केला, सबब बोलावयास आला, तेव्हां त्याजपासोन खात्री घेणें ती.
२६. तकरीर- वाद्याचा लेख वाद्यास दाखवून त्याजवरी लेहून घेणें ती.
२७. तगीरपत्र - कामावरून काढणें तें.
२८. तच करेपत्र - महालीं कमाविसदारावरी पैका घेतल्याचा मुद्दा शाबीत करून तुफानदार आला, ज्याजपासोन निशा सरकारनें घेऊन कमा विसदार बोलावून आणून रुजुबात करबिली; सबब पत्र लेहून घेणें तें.
२९. तह- सरकारनें कोणताही जुजबी करार किंवा नियम केला तो.
३०. तहनामा - दोन राज्यांत नेमबंदी झाली तो.
३१. ताकीदपत्र- बखेडा जाला त्याविषयीं लिहिणें तें.
३२. थळपत्र - थळ नेमून दिल्हें, तेथें पंचाईत जाली, तें.
३३. दस्तक - हंशील माफ करणे जकातीचें तें.
३४. दंडपत्र- न्यायी खोटा झाला त्यापासोन द्रव्य घेणें त्याचें पत्र तें.
३५. दुमालपत्र- नवा अंमलदार आला, माजी अंमलदारापासोन इनामी वगैरे जाबसाल लेहून आणणें तें.
३६. निवाडपत्र- सरकारांत न्याय मिळाला तें.
३७. निशाचिट्टी- जमीदारापासून अगर कमाविसदारापासून ऐवजाची खातर घेणें ती.
३८. निशापत्र - जमीदार सामील करून कारकुन कमाविसदारांनी द्रव्य खादलें त्याजपासोन धणी घेणें, निशा घेणें तें.
३९. निशेदारी - वर नं. २५ मधील जामीनीला उगवणी ती. खताखालीं 'यासि उगवणीस धणी अमुक' पुढे गुंतवणें तसे लिहिणें.
४०. नेमोत्तरपत्र - वादीस थलींहून निरोप देतेसमर्थी पुन्हां यावयाची मुदत करून घ्यावी तें.
शिवकालीन पत्रातील सर्व प्रकारच्या कालगणना सोप्या भाषेत समजून घ्या
४१. पावती-ऐवज पावला म्हणून लिहून घेणें ती.
४२. पुरशिस - करीना व तकरीर यांतील कलमें एकमेकांची बोलणी विचारून लिहून घेणें ती.
४३. फारखती- खत गमावलें त्याची.
४४. बहालपत्र किंवा बक्षिसपत्र -
४५. बक्षिसपत्र- बक्षिस दिल्हें तें.
४६. भाळपत्र - दिवा काढण्यास राजी झाला त्याचे मस्तकी उच्चारपत्र शीरी बांधतात तें.
४७. मनाचिट्टी- तगादा मना करणें ती किंवा बरातदार उठवून आणणें ती.
४८. मसालापत्र किंवा हुकमी रोखा- हुकूम मोडला अगर सालाबाद शिरस्त्याप्रमाणें न वर्तला तरी मसालापत्र लिहिणें तो.
४९. महजर- महालांत किंवा कसब्यांत पंचाईत किंवा मनसुबी जाली तो.
५०. माफीपत्र - अस्मानी म्हणजे पर्जन्य न पडला अथवा फार लागला व सुलतानी म्हणजे दग्यानीं लुटलें, त्याबद्दल सूट देणें तें.
५१. मुचलका- वादी यांचा परस्परें तंटा लेहून घेणें तो. ५२. मुदतबंदी मुदत करणें ती.
५३. मृत्युपत्र - मरणसमयीं लिहिलें तें.
५४. मोकदम जामीनकतथा- जातीस जामीन मोकदमास घेणें तो.
५५. मोजदादपत्र - अंमलावरी गेल्यावरी सरकारी जिनसा माजी मामलतदारापासोन घेणें तें.
५६. यजितपत्र - सर्वमतें खोटा झाला त्यापासोन लेहून घेणें तें.
५७. यादी - संस्थानिकांनीं हुजुर अर्ज करणें ती.
५८. राजीनामा- वादी याणीं खुषीनें लेहून दिल्हा तो.
५९. रोखा- करारमाफक तगादा व वरात करणें तो.
६०. लग्नचिट्टी- लमाचे वेळी लिहिली ती.
६१. बदणुक- पांढर, बलोते व भोंवरगांव मेळवून यांचे माथां इमान टाकून साक्ष पुसणे ती.
६२. वंशावळ - पिढ्यांतील नांवें लेहून घेणें ती.
६३. बाटेपत्र किंवा विभागपत्र - आपापसांत समजुतीनें वाटे झाले तें.
६४. वृत्तिपत्र- वृत्ति नेमून दिल्ही तें.
६५. सडीपत्र - महालींहून वाद्याचें वर्तमान लेहून आणणें तें.
६६. सनद - गांवावर किंवा महालावर मामलतदार किंवा कमाविसदार यांस लेहून देणें ती.
मोडी लिपी म्हणजे काय? येथे वाचा संपूर्ण माहिती
६७. समजपत्र- वाद न करितां समजुतीस आले तें.
६८. समापत्र - भाऊबंद वगैरे बतनभाऊ मेळवून घेणें एकदिल सारें होनें त्याचा ठराव करणें, तो केला तें.
६९. समलातपित्र - मदतीस बोलावणें तें.
७०. सरंजामपत्र- सरंजाम दिल्हा तें.
७१. सरकतनामा- सरकतीनें शेत बगैरे उदीम करणें तो.
७२. सामिलनामा- जातीनें आंगवण नाहीं सबब भाऊ उभा करणें त्यास लेहून देणें घेणें तो.
७३. सारांश- वाद्यावाद्यांचा कयास निवडून संभाविताचें मत देणें तो.
७४. साहित्यपत्र - नव्या अंमलदाराच्या मदतीकरितां दिलें तें.
७५. साक्षपत्र - साक्ष अगर गोही लिहून दिली तें.
७६. सोडचिट्टी–अंमल सोडणे त्याबद्दल लेहून देणें किंवा जप्ती करून सोडणें ती.
७७. इजिरीपत्रक - हजिरी घेणें तें.
७८. हप्तेबंदी - दरमुदत ऐवज घेणें त्याविषयीं लेहून घेणें ती.
७९. हरकीपत्र - न्यायांत खरा झाला त्यापासोन पैका घेणें त्यान्चें पत्र तें.
८०. हरदुमुसना जुमला ( मुजरा ? ) - चिट्टी गमावली ती नवीन करून घेणें त्यास.
८१. हुकुमीपत्र - कामगिरीवर रवाना करणें तें.
८२. हुकमो रोखा- हुकूम मोडला अगर सालाबाद शिरस्त्याप्रमाणें न वर्तला तरी मसालापत्र लिहिणें तो.
८३. हुज्जत पोत्यास ऐवज जमा केला त्याची पावती देणें ती.
८४. हुंडी-ऐवज देऊन देशावरावरी घेणें ती.
शिवरायांच्या काळातील अथवा त्यानंतर ची पत्रे वाचताना तत्कालीन समाजव्यवस्था तर समजतेच पण त्याबरोबर त्याकाळी वापरली जाणारी भाषा आणि त्या अनुषंगाने केलेली शब्दांची योजना आपणाला खिन्न करून सोडतात. ऐतिहासिक पत्रं म्हटलं की मोडी आणि फारसी यांची माहिती असणे जरुरी आहे. जितकी व्यवस्थित पत्रे मोडी लिपीतील असतात तितकी फारसी पत्रे दिसत नाहीत.
या पत्रांचा अभ्यास करताना इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे म्हणतात
आजरोजी आपण फक्त स. न. वि. वि. इतकाच मायना लिहतो पण ऐतिहासिक पत्रात तो श्रियासह विराजित अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री ..... साहेब असा होतो. जिथं मायना लिहताना इतका आदर दिला आहे तिथे इतर गोष्टीत किती खबरदारी घेतली असेल? ज्यावेळी या ऐतिहासिक पत्रांचा आढावा आपण घेतो त्यावेळी असं लक्षात येतं की ही पत्रे ठराविक एका पद्धतीने लिहलेले आहेत. पत्र कुणाला लिहीत आहोत याची जाणीव ठेवून मायना वापरला जातो तसेच त्या व्यक्तीला योग्य तो आदर देण्यासाठी अनेक योजना या पत्रात असतात. व्यावहारिक आणि वैयक्तिक असे आज जे पत्रांचे मुख्य प्रकार आहेत ते त्याकाळी देखील होते हे समजते.
शिवकालीन पत्रात प्रामुख्याने खालील गोष्टींची काळजी घेतलेली आपणाला दिसते.
१) श्रीकार
२) शिक्का
३) कालगणना
४) मायना
५) मुख्य मजकूर
६) समाप्ती मुद्रा
वर उल्लेखित मुद्दे कुठे आणि कोणत्या स्वरूपात वापरायचे याचे नियम ठरलेले असून त्याविषयी सविस्तर माहिती पुढे घेऊ.
शिवकाळात पत्र नक्की कोणत्या कारणास्तव लिहिले त्यावरून त्याचे ८४ प्रकार पडतात ते येथे जाणून घ्या
श्रीकार
पत्राच्या सुरवातीला आपले आराध्य दैवतेचे नाव लिहले जाते अथवा ''श्री" हा शब्द लिहला जातो. शिवरायांच्या बहुतेक पत्रात श्री येतो तर कधी 'श्री शंकर', 'श्री तुळजाभवानी', 'श्री भवानी शंकर', 'श्री शंकर प्रसन्न', 'श्री ज्ञानदेव' असे श्रीकार येतात. अजून एक महत्वाचा मुद्दा येथे लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे श्रीकार लिहिताना दिसून येतो तो आदरभाव. एखाद्या पूज्य व्यक्तीला पत्र लिहिताना योग्य तो आदर देण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव पत्राच्या सुरवातीला एकदाच लिहिले जाते आणि जिथे जिथे त्या व्यक्तीच्या नावाची पुनरावृत्ती होईल तिथे तिथे जागा रिकामी ठेवली जाते. मोरया गोसावी अथवा समर्थ रामदासांना लिहलेल्या पत्रात या गोष्टी आपण पाहू शकतो. आदरभाव दाखविण्याच्या अशा अजून पद्धती पुढे देखील आपण पाहणार आहोत.
लेख कितपत महत्वाचा आहे यावरून त्यावर अजूनही काही अक्षर लिहिली जातात. जसं की एखादे पत्र किंवा महजर जास्त पानांचा असेल तर त्या पांनांची संख्या नमूद केली जाते. समजा एखादा महजर १० पानांचा असेल तर त्यावर १\१० लिहलेले असते तसेच एखाद्या महजराचे ४ वेगवेगळे भाग असतील तर ४\१ लिहलेले दिसते.
ऐतिहासिक पत्रातील रेघांचे देखील असतात प्रकार | जाणून घ्या त्यांची नावे आणि वापरण्याच्या पद्धती
शिक्का
पत्राचे अथवा संबंधित कागदाचे महत्व काय आहे ते जाणून त्यावर शिक्का उठवला जात असे. थोडक्यात खूपच महत्वाचे पत्र असेल तर त्यावर छत्रपतींचा शिक्का असतो अथवा प्रधानांच्या शिक्क्याने काम होऊन जाते. पत्राच्या सुरवातीला मारला जातो तो मुख्य शिक्का तर पत्राच्या शेवटी उठवली जाते ती समाप्ती मुद्रा. एखादे पत्र मोठे असेल व त्यासाठी अनेक कागद वापरले असतील थोडक्यात महजर चे कागद यावर ते कागद जिथे जिथे जोडले जातात त्या त्या जोडावर देखील शिक्का मारला जातो जेणेकरून कुणीही मधले कागद बदलून आपला इच्छित मजकूर लिहणार नाही. मुख्य शिक्का पत्राच्या सुरवातीला श्रीकाराच्या खाली अथवा पत्रात दोन ते तीन ओळींनंतर उठवला जातो. आजरोजी काही ठराविक च पत्र उपलब्ध आहेत ज्यावर शिवरायांची मुद्रा आहे. बाकी सर्व पत्रे शिवरायांच्या नावाने दफ्तरातून निघाली आहेत मात्र त्यावर प्रधानांची मुद्रा पाहायला मिळते. पत्राच्या शेवट मात्र समाप्ती मुद्रेने होतो ज्यामध्ये खालील प्रमाणे लेख असतात
१) लेखनालंकार
२) मर्यादेय विराजते
३) लेखनसीमा
४) लेखनाधिकार
कधी कधी पत्राच्या शेवटी खाशांच्या हस्ताक्षराने पत्राचा शेवट होतो म्हणजेच संपूर्ण पात्र कारकून लिहतात मात्र पत्राच्या शेवटी एखादा शब्द अथवा वाक्य पाठविनारी व्यक्ती लिहते आणि पत्राचा शेवट होतो. यामुळे किंवा मर्यादा मुद्रेमुळे पत्र पाठविल्यानंतर कोणतेही बदल केले जाण्याची शक्यता कमी होते.
काही महत्वाच्या बाबी
कोणते काम कोणी करावे याविषयी शिवरायांनी जाबता करून दिला. याचा विचार केला तर राज पत्रावर शिक्का मोर्तब करायचा अधिकार मुख्य प्रधान यांचा असे.
मुख्य प्रधान यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रांवरी शिक्का करावा.
या जाबत्यात कोणत्या प्रसंगानुसार कोणी शिक्का मोर्तब करावा याचे अनेक उल्लेख आहेत.
आधी मोर्तब उठवण्याचा जो क्रम दिला आहे तो काही ठिकाणी बदलेला दिसतो. एखाद्या विद्वान, मानाने मोठ्या व्यक्तीला पत्र लिहतांना आपल्या नावाचा शिक्का त्या पानावर शेवटी अथवा पत्राच्या शेवटी मारला जातो. यावरून एखाद्या प्रती आदर व्यक्त करण्याची भावना दिसून येते.
कालगणना
ऐतिहासिक पत्र म्हटलं की सगळ्यात आधी ठरतो तो त्याचा काळ? पत्र नक्की कोणत्या वर्षीचे आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. काही ठिकाणी खोटी पत्रे बघायला मिळतात ज्यांची पारख फक्त त्यावरील तारीख बघून होते. मुस्लिम राजसत्तेपूर्वी हिंदुस्थानात संवत्सर, शक, तिथी, माह अशी हिंदू कालगणना वापरली जात होती
पूर्वी वापरली जाणारी हिंदू कालगणना काळाच्या ओघात पडद्याआड झाली आणि तिची जागा मुस्लिम कालगणनेने घेतली. त्यात परत तिचे अनेक प्रकार पडेल जसे जुलूस, फसली, सूहूर सन इत्यादी.
मायना
मायना
म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो स.न.वि.वी. ( सप्रेम नमस्कार विनंती
विशेष). पण पूर्वी इतके साधे मायने नव्हते. पत्रातील मायने वाचून पत्राचे
वजन लक्षात येते. कोणता मायना कोणासाठी, स्त्रियांसाठी काय मायना असावा,
त्यात ती स्त्री लग्न झालेली असेल तर काय लिहावे किंवा पुरुषासाठी असेल तर
त्याचे वय, हुद्दा लक्षात घेतला जात.
शिवराय सुरवातीला मुस्लिम पद्धतीने मायना लिहीत म्हणजे
अजरख्तखाने शिवाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानी हवालदारानी हाल व इस्तकबिल
अर्थात, शिवाजी राजे यांच्या कचेरीतून हे पत्र सध्या आहेत व इथून पुढे असतील अशा कारकून व हवालदार यांसाठी आहे. राज्यभिषेकानंतर मात्र ही पद्धत बदलून शिवरायांनी हिंदू पद्धतीने कालगणना सुरू केली. त्यानंतर मायने पुढीलप्रमाणे सुरू झाले.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ( चालू राज्याभिषेक शक, संवत्सर, माह, तिथी, वार)
कित्येक वर्षांनंतर पत्रावर हिंदू कालगणना वापरण्याचे धाडस उरी बाळगणारे छत्रपती शिवराय हे एकमेव राजे झाले.
राज्याभिषेक विषयी सविस्तर वाचा
मराठ्यांच्या सत्तेच्या उत्कर्ष मध्ये न्यायमूर्ती रानडे म्हणतात
शिवाजीने पत्रांचे मायने देखील अशाच पद्धतीने सुधारले
स्त्रियांच्या बाबतीत देखील तितकाच आदर ठेवला जात. पत्राच्या मायन्यात स्त्रियांना आई अथवा बहिण असे संबोधून लिहले जाई.
सकल सौभाग्यवती वज्र चुडेमंडित
सौभाग्यवती मातोश्री
श्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब
असे काही मायने स्त्रियांना उद्देशित दिसतात.
मुख्य मजकूर
'पत्र लिहण्यास कारण की ' या वाक्याने आजकाल पत्रांची सुरवात होते यापेक्षा वेगळी आणि विविधतापूर्ण सुरवात पूर्वी केली जात. यावरून नक्की कोणती घटना घडली किंवा पत्राचे कारण लगेच उघड होत.
जसं की
ऐसी खबर कळो आली की...
तुम्ही पात्र पाठवले ते उत्तम समयी पावले...
तुम्ही पत्र पाठविले ते आसीर्वादपूर्वक वाचन लिहिली ते कलोन समाधान जाले...
तुमचे बाबे हुजुर खबर मालुम जाली जे...
हूजुर येऊनु मालुम केले जे...
यानंतर मुख्य गद्य सुरू होतो. शिवरायांची पत्रे त्यातील भाषा आणि शब्द योजना यांचा अभ्यास केला तर पत्राची जरब समजून येते. वेळोवेळी सरदारांची केलेली कानउघाडणी असो किंवा प्रेमाने सांगितलेले चार शब्द यातून शिवरायांचे विचार नक्कीच प्रकट होतात. इतकं असून देखील शिवरायांचं हस्ताक्षर आज पर्यंत इतिहासाला माहीत नाही ही खरी शोकांतिका. शिवरायांनी वापरलेली वाक्ये आजदेखील तितकीच जरब देणारी वाटतात. जसं की शिवरायांनी त्यांचे बंधू व्यंकोजी ला लिहलेले पत्रात ते म्हणतात
रिकामें बसून, लोकहाती नाचीज खाववून, काळ व्यर्थ न गमावणे, कार्यप्रयोजनाचे दिवस हे आहेती, वैराग्य उत्तरवयी कराल, ते थोडे आजही उद्योग करून आम्हांसी (पराक्रमाचे) तमासे दाखविणे.
१३ मे १६५९ च्या पत्रात शिवरायांनी बाजी प्रभूला एक पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी किल्ल्याच्या डागडुजी विषयी काही सूचना केल्या आहेत जेणेकरून गडाचे काम मजबूत होईल. त्यासाठी पिलाजी भोसले सोबत २५ लोक देऊन कामकाज कसे करावे याविषयी सविस्तर लिहिले आहे.
.... हवालदारास घर व लोकास अळंगा मजबूत करूनु देणे. घर व अळंगा करूनु द्याल त्या पावसाने आजार न पावे ऐसा करूनु देणे. नाही तरी सजवज करूनु द्याल...
यात घरे कशी बांधावी हे सांगितले तर आहेच पण वरून एक चपराक पण मारली आहे जेणेकरून त्या कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही. मजूर घरे बांधतील पण फक्त सजवज म्हणजे दिखावा म्हणून आणि ती मजबूत होणार नाहीत, पावसात ती टिकणार नाहीत.
समाप्ती मुद्रा
पत्राची सुरवात इतकी मस्त असते तर शेवट देखील तितकाच वैशिष्ट्य पूर्ण
असावा. शेवट कसा करावा याचे देखील तंत्र पूर्वी ठरलेले होते. यासाठी काही
ठराविक शिक्के असतं यांना 'मर्यादा मुद्रा' किंवा 'मोर्तब' म्हणत. यावर
कोरलेली अक्षरे ठरलेली होती. पत्राचा शेवट जेथे करावयाचा तेथे शेवटच्या
शब्दाला अगदी चिकटून हे शिकले मारले जात जेणेकरून पत्रातील मजकुराशी कुणी
छेडछाड नाही करणार. या शिक्क्यातील मजकूर खालील प्रमाणे असतात.
मर्या देयं विराजते
लेखनसीमा
इतिमर्यादा
इत्यलम
पत्रावधिरंय भाती
अजून
एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करावी वाटते. या शिक्यांच्या आधी किंवा
शिक्क्या ऐवजी काही वाक्ये आढळतात. आता ही वाक्ये काही ठिकाणी खाश्याच्या
हस्ताक्षरात देखील दिसतात. म्हणजे संपूर्ण पत्र त्या व्यक्तीचा लेखनिक
लिहतो पण त्याचा शेवट मालक करतो. मुख्य व्यक्ती पत्राचा शेवट करताना पत्र
वाचून मग शेवटी एक वाक्य लिहितो आणि त्यापुढे मग मोर्तब केली जाते.
शिवरायांच्या पत्रात अशी वाक्ये आढळतात. इतर मजकूर आणि पत्र समाप्तीची ओळ
काही ठिकाणी वेगळी दिसते पण ती नक्की शिवरायांनी लिहिली का? यावर
प्रश्नचिन्ह उभे राहते कारण शिवरायांची जेमतेम पत्र उपलब्ध आहेत ज्यातून
शिवरायांचं हस्ताक्षर नेमक कोणतं हे समजणे अवघड आहे. पत्राचा शेवट
करण्यासाठी शिवरायांच्या पत्रात आलेली काही वाक्ये खालील प्रमाणे
जाणिजे
बहुत काय लिहिणे
कौल असे
हे बरे म्हणून वर्तणूक करणे
बहुत लिहिणे नलगे
कोणे गोष्टी चिंता न करणे
उजुर न करणे
एक जरियाची तसविस न देणे
ताकीद असे
हे बरे म्हणून वर्तणूक करणे
ऐसे समजून वर्तणूक करणे
छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर पत्र समाप्तीची वाक्ये जसे
की 'सुज्ञ असा', 'लेखनालंकार', 'सुज्ञ असा' स्वतःच्या हस्ताक्षरात लिहले
जात.
अशा प्रकारे शिवरायांच्या काळी पत्रे कशी होती याचा थोडा विचार येथे केला
आहे. शिवरायांचे एक एक पत्र अभ्यासायचे म्हटले तर त्यावर प्रबंध होतील इतके
गहन अर्थ त्याचे होतात. त्यामुळे इथे फक्त काही महत्वाचे मुद्दे, पत्रे
घेऊन आणि काही ठराविक बाबींचा विचार करून उहापोह केला आहे.
मोडी लिपी: मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दाचे हुबेहूब मराठी भाषांतर आहे
मोडी लिपी नक्की कुणी आणि कधी आणली किंवा तिचा शोध कोणी लावला याविषयी इतिहासकार मंडळीत एकमत नाही. पण तरी देखील एका मताचा जास्त पुरस्कार केला जातो तो म्हणजे मोडी लिपीचा प्रसार यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री याने केला. देवनागरी लिहण्यासाठी वेळ लागतो तसेच दोन दोन वेलांट्या व उकार यामुळे अजून ती वेळखाऊ बनते आणि त्यात परत व्याकरणाची भर.
![]() |
| Image source: Onkar Todkar |
या सर्व क्लिष्ट गोष्टी बाजूला ठेऊन मराठीला एका शीघ्र लिपीची गरज होती ती मोडी ने पूर्ण केली. प्रत्येक लिपीला किंवा भाषेला एक शीघ्र लिपी असतेच जस की फार्सी भाषेला शिकस्ता नावाची जलद लिपी आहे. मोडी मध्ये लिखाण करताना पेन किंवा जी काही लेखणी आपण वापरत असू ती देवनागरीच्या तुलनेत खूप कमी वेळा उचलावी लागते परिणामी एखादा व्यक्ती बोलत असेल तरी शब्द काही अंशी जसेच्या तसे लिहता येतात.
![]() |
| Image source: Ram Waghole |
मोडी विषयी राजवाडे म्हणतात,
दफ्तरावरील मुख्याधिकारी जो हेमाडपंत त्याने मोडी लिपी महाराष्ट्रात नव्याने सुरू केली... मोडी लिहण्याची पद्धत हेमाद्रीने मुसलमानांच्या शिकस्ता नामक लेखन पद्धतीवरून घेतली. फारशीत लिहण्याची पद्धती अनेक आहेत त्यात नस्ख व शिकस्ता ह्या आपल्याकडील बाळबोध व मोडी यांच्याशी जुळतात.... फारशीत शिकस्तन ह्या क्रियापदाचा अर्थ मोडणे असा होतो. जलदीने लिहण्यात खडे अक्षर मोडून लिहण्याचे जे वळण आहे त्याला फारशीत शिकस्ता म्हणतात. मोडी हा शब्द फारशी शिकस्ता ह्या शब्दाचे हुबेहूब मराठी भाषांतर आहे.
हेमाद्रीने घालून दिलेला मोडीचा हा शिरस्ता बघता बघता संपूर्ण राज्यात अवलंबिला आणि सर्व व्यवहार मोडीत सुरू झाले. ही लिपी जनमानसात इतकी रुजली की पुढे मुसलमानी सत्ता देखील आपले दानपत्र, महजर व इतर व्यवहार मोडीत करत.
![]() |
| Image source: Maheshwar Chavhan |
पूर्वी मोडी लिखाणासाठी बोरू वापरला जात. बोरू म्हणजे बांबु सदृश झाडाची फांदी असते जीचा एक भाग पेनाच्या निफ सारखं बनवितात. बोरू वापरण मुळात क्लिष्ट गोष्ट आहे कारण बोरुत शाई कधी जास्त येते तर कधी कमी. बोरू सारखं सारखं शाईत बुडवावा लागतो. इंग्रज काळात पुढे टाक आले ज्याच्यामुळे लिहण्याची गती अजूनच वाढली. टाकाने लिहिताना लेखणी खूप कमी उचलावी लागत होती त्यामुळे अक्षरं सलग आणि एकमेकात गुंतलेली दिसतात. टाकाची मोडी म्हटलं की आजही स्वयंघोषित मोडी तज्ञांच्या पायाखालची जमीन सरकते.
शिवकालीन पत्रांचे ८४ प्रकार येथे जाणून घ्या
मोडी लिपीत बोरूने लिहण्याची पद्धत खालील व्हिडिओत पाहू शकता
मोडीतील मुळाक्षरे
मोडी लिपीत जे स्वर आहेत त्यामध्ये ए व ऐ साठी वेगळे वळण नसून अ वर
अनुक्रमे एक आणि दोन मात्रा देऊन लिहले जातात. देवनागरी मध्ये दोन
प्रकारच्या वेलांटी आणि ऊकार असतात पण मोडीत एकच वेलांटी आणि ऊकार येतात.
मोडीत वेलांटी आणि ऊकार काढण्याची पद्धत मुळाक्षरानुसार बदलते. काही अक्षर
थोड्या फार फरकाने सारखी दिसतात जस की ह, ख, द थ त्यामुळे मोडी कागद
वाचताना शब्द नक्की काय आहे हे ओळखणे थोडे अवघड वाटते.
मोडी मधील स्वर आणि व्यंजने खालीलप्रमाणे
![]() |
| Image source: Ram Waghole |
मोडी मधील बाराखडी खालीलप्रमाणे
![]() |
| Image source: Ram Waghole |
![]() |
| Image source: Ram Waghole |
शिवकालीन पत्रातील खाचाखुणा जाणून घ्या
मोडी कागद वाचनातील अडचणी
आधी सांगितल्याप्रमाणे मोडी ही मराठीची शिघ्रलीपी आहे. मोडी लिपीमध्ये
लिहताना आधी एक अखंड रेघ ओढली जाते तिला शिरोरेघ बोलतात. शिरोरेघेवर मग
अक्षर सलग लिहली जातात त्यामुळें अक्षर नक्की कुठे तोडायचे हे समजत नाही.
आणि मुळात ही गोष्ट समजली नाही तर मग खालील प्रमाणे चुकीचं अर्थबोध होतो.
उदाहरणार्थ, खाली एक वाक्य न तोडता लिहले आहे.
रस्त्यातनाचतमासेचाललेहोते
वरील हे वाक्य दोन पद्धतीने वाचता येते
रस्त्यात नाचत मासे चालले होते
रस्त्यात नाच तमासे चालले होते
नक्की कोणता शब्द कुठे तोडायचा हे समजले नाही वरीलप्रमाणे अनेक चुका होतात ज्या कधी कधी मजेशीर असतात.
जसे शब्द कुठे तोडायचा हे समजत नाही तसेच अक्षर ओळख पण चुकू शकते कारण
मोडीत काही शब्द थोड्या फार फरकाने सारखे दिसतात. प्रत्येकाचं हस्ताक्षर
आणि लिहण्याची पद्धत वेगळी असल्याने शब्द कोणता आहे हे देखील समजत नाही.
'र' ची करामत
मोडीमध्ये लिहीत असताना काही ठराविक ठिकाणी शब्दाच्या शेवटी र आला तर तो
वेगळा न लिहता त्याच शब्दाला लागून लिहला जातो ज्यातून 'र' ची वेगळी करामत
दिसून येते. या कारणाने 'र' या शब्दाची लिहण्याची पद्धत वेगळी असू शकते.
![]() |
| Image source: Maharshtra State Modi book |
हिंदू कालगणना सोप्या भाषेत समजून घ्या
शब्द संक्षेप
आज रोजी आपण पत्रात काही ठराविक शब्दांचे संक्षिप्त रूप वापरतो उदाहरणार्थ
स.न.वि.वि. असेच काही शब्द संक्षेप पूर्वी मोडी पत्रात देखील आढळतात. ज्या
शब्दाचे संक्षिप्त रूप लिहायचे आहे त्याचा पहिला शब्द आणि त्याच्या पुढे
दोन उभ्या रेघा देऊन ते संक्षिप्त रूप आहे हे दर्शविले जाते
उदाहरणार्थ खाली काही संक्षेप व त्यापुढे त्याचे
सा || - साष्टांग
गो || - गोसावी
सौ || - सौभाग्यवती
गु || - गुजारत
मु || - मुक्काम
क || - कसबे
रु || - रुपये
काही शब्द असे आहेत ज्यांचे अनेक अर्थ निघतात. वाचकाला यातील सगळे पर्याय माहित असायला हवेत. चुकीच्या ठिकाणी चुकीचे शब्द वापरल्याचे बरेच उदाहरण आजकाल पाहायला मिळतात.
व || - वद्य, वजारद, बलद
ब || - बाबत, बद्दल
स || - सबब, सरकार, साष्टांगत || - तर्फ, तपशील, तालुका, तारिख, तागाईत, तकसीम, तपे
खु || - खुर्दखत, खुर्दा, खुर्द, खुदायेवंत
नि || - निशाणी, निमित्त, निसबत
मु || - मुदत, मुकाम, मुताबिक मुहंमद
वि || - विज्ञापना, विदीत, विनंती, विद्यमाने, विजारत,
विद्यार्थी
मो || - मोकदम, मोर्तब, मोहर
सु || - सुध्दा, सुभे, सुमार, सुहूर
ह || - हस्ते, हद्द, हवाले
क || - कसबा, कर्यात कारकीर्द
पा || - पाठवले, परगणे, पासूनगु || - गुजारत, गुदस्त
ख || - खेरीज, खरेदी, खास, खाजगत
याच्या पुढे जाऊन काही शब्दांच्या शेवटी र आला तर पहिला शब्द देऊन त्यापुढे दोन रेघा दिल्या जातात आणि शेवटच्या रेघेला र च्या करामती प्रमाणे र काढला जातो.
म||र - मजकूर
क||दार - कमाविसदार
हु||र - हुशार
द||र - दस्तुर
मोडी पत्र म्हटलं की त्यात फारसी शब्द येणे साहजिकच आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकापूर्वी पत्रात ६०% शब्द फारसी येत होते. त्यांनतर शिवरायांनी त्यात सुधारणा केल्या पण काही काळाने मराठ्यांचे व्यवहार परकीय सत्ता आणि इतर राज्यांशी सुरू झाले आणि त्यामुळे परत काही इतर भाषांतील शब्दांचा शिरकाव झाला असे दिसते. उदाहरणादाखल काही शब्द खाली दिले आहेत.
शिवकालीन कालगणना नक्की कशी होती ते जाणून घ्या
अजकदीम - फार दिवसांपासून
अज देहे - एकंदर गावे
अर्जुदा - रुष्ट
अलाहीदा - निराळी
अहद - पासून
आलंगनौबत - निशाण
इजमायली - एकूण
इजाफा. - वाढ
इतला - समंती
इतलाख - पगारी
इनायत - देणगी
उलफा - कच्चे अन्नन
मोडी म्हटलं की लोकं तिच्याकडे क्लिष्ट लिपी म्हणून च पाहतात. पण आज इतिहास समजून घ्यायचा असेल तर मोडी शिकल्याशिवाय पर्याय नाही. मोडी न शिकता इतिहास अभ्यासायचा म्हणजे मुश्कील च. मोडी शिकल्यानंतर क्रमाक्रमाने पत्रे वाचावी जेणेकरून ती लिपी आपल्या नजरेत बसते आणि तितकी अवघड वाटत नाही. शिकल्यावर लगेच टाकाची मोडी किंवा स्टॅम्प वाचायला घेऊ नये.
![]() |
| Image source: Ram Waghole |
अहो! काही लोक अशी देखील आहेत की, त्यांनी कागदावर मोडी लिपीत मजकूर लिहला तर पानावर मोती टाकल्याचा भास होतो. ज्याला मोडी कळत नाही असे लोक देखील त्या अक्षरांकडे टक लाऊन बघतात. माझ्या परिचयात असे दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे परिंचे गावावर अभ्यास करणारे राम भाऊ वाघोले आणि दुसरे व्यक्ती म्हणजे महेश्वर चव्हाण. या लेखात वापरलेले सर्व फोटो हे श्रीयुत राम वाघोले आणि चिरंजीव महेश्वर चव्हाण यांनी दिले आहेत. त्याबद्दल दोघांचे आभार.
बहोत काये लिहणे !
सुज्ञ असा !
लेखनलांकर !
सेवेसी तत्पर
ओंकार निरंतर
👇👇👇
![]() |
| Image source: Ram Waghole |
भाग 5 - व्यंजनांच्या दहाखडी
भाग 6 - प्रश्न व त्यांची अचुक माहीती
भाग 7 - मोडीलीपीच्या फॉण्टची ओळख माहीती
भाग 8 - मोडीतील अक्षरे गीरवा
भाग 9 - मोडीतील जोडाक्षरे
मोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण !
पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजच्या मराठा इतिहास संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. गिरीश मांडके डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागात दोन दिवसीय व्याख्यानमालेसाठी आले होते. ‘शिवकालीन आणि पेशवेकालीन मोडी कागदपत्रे’ या विषयावर त्यांची भाषणे झाली. या प्रसंगी ‘मोडी’ लिपीतील संशोधनाच्या सद्यस्थितीविषयी त्यांची मुलाखत घेता आली. इतिहासकाळातील समाज, भाषा, लिपी अभ्यासण्यासाठी आज कोणत्याही ‘विद्यापीठीय संशोधकाकडे वेळ नाही’ आपापली इष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी शॉर्टकट शोधले जातात. पीएच.डी.साठी सहज साध्य विषयांची निवड केली जाते. त्यामुळे या क्षेत्रातील अपप्रवृत्ती बळावतात आणि इतिहास संशोधन राहून जाते, अशी परखड मते त्यांनी यावेळी मांडली. त्या सविस्तर मुलाखतीचा हा संपादित अंश.
१. प्राचीन ब्राह्मी लिपी मागे पडून अन्य लिपी कशा पुढे आल्या?
– ६ व्या ते ७ व्या शतकापर्यंत ब्राह्मी लिपी संबंध हिंदुस्थानात वापरात
होती. अगदी बदामीच्या चालुक्यांपर्यंतचे ताम्रपट ब्राह्मी लिपीत मिळतात.
याच काळापासून राष्ट्रकूटांचे ताम्रपट देवनागरी लिपीत यायला लागलेले दिसून
येतात. त्यात दंतिदुर्गाचा ताम्रपट डेक्कन कॉलेजमध्ये आहे. भाषा प्राकृत
असली तरी लिहिण्याची लिपी ब्राह्मी आणि देवनागरी होती. पुढील काळात
ब्राह्मी मागे पडत गेली आणि देवनागरीचा प्रसार झाला. त्यानंतर यादव काळात
वेगाने लिहिण्यासाठी मोडी लिपीचा शोध लागला. तीच पुढे व्यवहाराची लिपी
बनली.
२. ‘मोडी’चा उदय कसा झाला? गुजरातच्या कच्छ क्षेत्रातील ‘मोड वणिक’ या व्यापारी लोकांची लिपी मोडी, हे खरे आहे काय?
– नाही, तसे म्हणता येत नाही. मोड वणिक किंवा मारवाडी व्यापा-यांच्या
लिपीचे मोडीशी साधर्म्य असले तरी देवनागरी वेगाने लिहिण्यासाठी पर्यायी
लिपी आवश्यक होती. उत्तर हिंदुस्थानात इस्लामच्या प्रभावकाळात फारसीचा वापर
वाढला. तिची लिपी ‘शिकस्तन’ म्हणजे तोडून लिहिण्याची लिपी. दक्षिणेत या
काळात यादवांचा प्रधान हेमाद्रीपंताच्या काळात ‘बाळबोध’ला मोडून लिहिण्याचा
प्रघात सुरू झाला. वेगाने देवनागरी अक्षरे मोडून लिहिली जाऊ लागली. तीच
मोडी लिपी.
३. ‘मोडी’चा उपयोग कसा आणि कुठे केला गेला?
– मोडीचा सर्वाधिक उपयोग व्यापा-यांनी केला. चोपडी, व्यापारविषयक हिशेब आणि
जमा खर्च लिहिण्यासाठी ही लिपी सर्रास वापरली गेली. त्याचबरोबर ही
पत्रव्यवहाराची लिपी बनली. व्यापारी आणि सामान्यजनांच्या रोजच्या व्यवहारात
मोडी लिपी लोकप्रिय झाल्याचे आज त्या लिपीत मुबलक उपलब्ध असलेल्या
दस्तऐवजांवरून लक्षात येते. आज महाराष्ट्रात कोट्यवधी ऐतिहासिक आणि
पेशवेकालीन पत्रव्यवहार आणि कागदपत्रे बहुतांशी याच लिपीत आढळतात.
४. मोडी लिपीच्या अभ्यासातून काय लक्षात येते? इतिहासाच्या अभ्यासकाने ही लिपी का अभ्यासावी?
– मोडीच्या अभ्यासातून इतिहास काळातील राजकीय आणि सामाजिक इतिहासाबरोबरच भाषाशास्त्रीय विचार मिळतो. मोडी लिपीबद्ध कागदपत्रांतून
तत्कालीन समाजाचे अनेक बंध उलगडतात. महसूल, खगोल, भूगोल, व्यापार, शेती,
कौटुंबिक, राजकीय संबंध यांच्यावर प्रकाश पडतो. थोडक्यात महाराष्ट्राच्या
संदर्भात बोलायचे तर इतिहासाच्या अभ्यासाची दारे या लिपीच्या अभ्यासानेच
उघडतात. १८ व्या शतकात अनेक अहवाल या लिपीत लिहिले गेले. त्यात वनांसंबंधी
काही उल्लेख आले आहेत. महाराष्ट्रातील वनक्षेत्रात आज जवळजवळ नामशेष
झालेल्या कित्येक वनस्पतींचे उल्लेख त्यात आढळले आहेत. जनवादी इतिहासाच्या
अभ्यासासाठी तर मोडी कागदपत्रांसारखा खजिना दुसरा नाही.
५. मराठ्यांच्या इतिहासाचा प्रमुख स्रोत समजली जाणारी कोट्यवधी
कागदपत्रे या लिपीत आहेत. तरीही मोडीच्या अभ्यासाकडे अभ्यासक पाठ फिरवतात.
हे खरे आहे काय?
– होय. आज इतिहासाच्या बहुतांश अभ्यासकांना मोडी येत नाही. त्यामुळे
संशोधकांचा हात न लागलेली लक्षावधी कागदपत्रे आज महाराष्ट्रभर पसरलेली
आहेत. ती पाहण्यासाठी, वाचण्यासाठी कुणी समोर येत नाही. मेहनत घेण्याची
फारशी इच्छा नाही, ही शोकांतिकाच आहे. अनेक विद्यापीठांनी या लिपीतील
शिक्षणासाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. पण या मोडी वर्गांना तुरळक
उपस्थिती असते. इतिहासाच्या अभ्यासकांना मोडी लिहिता-वाचता आली तर
इतिहासातील अनेक पेच सुटू शकतील.
६. अभ्यासक, संशोधकांना मोडी न येण्यामुळे इतिहासाच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे, असे तुम्हाला वाटते का?
– प्रामुख्याने मराठ्यांच्या इतिहासाची बहुतांश साधने मोडी लिपीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सगळेच घेतात. मात्र त्यांच्या इतिहासाचे संशोधन
करण्याची वेळ आली की, मेहनतीपासून पळ काढतात. संशोधनासाठी जो अभ्यास, श्रम
करावे लागतात. ते कुणी करत नाहीत. त्या काळातील समाज, भाषा, लिपी
अभ्यासण्यासाठी आज कोणत्याही ‘विद्यापीठीय संशोधकाकडे वेळ नाही’ आपापली
इष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी शॉर्टकट शोधले जातात. पीएच.डी.साठी सहज साध्य
विषयांची निवड केली जाते. त्यामुळे या क्षेत्रातील अपप्रवृत्ती बळावतात आणि
इतिहास संशोधन राहून जाते. संशोधकांना मोडी न येण्याने सर्वाधिक नुकसान
मराठ्यांच्या इतिहासाचे झाले आहे.
७. इतिहास संशोधनातील अपप्रवृत्तींवर थोडा अधिक प्रकाश टाकाल काय?
– मोडी शिकण्यापासून पळ काढल्यामुळे संशोधक दुय्यम साधनांवर अवलंबून राहू
लागतो. इतिहासाचे सर्व विषय मग मूळ साधनांकडे न जाता दुय्यम आणि तिय्यम
साधनांच्या आधाराने अभ्यासले जातात. त्यामुळे संशोधनाचा दर्जा तर खालावतोच
पण त्याचबरोबर संशोधन आपली वस्तुनिष्ठता गमावते. मोडीपासून पळ काढलेले
संशोधक आधुनिक इतिहासाचा अभ्यास करतात. पण मग तोही नीट होत नाही आणि यातून
‘कॉपी-पेस्ट’ संस्कृतीचा उदय होतो. मोडी, ब्राह्मी, देवनागरी लिपी बरोबरच
संस्कृत, फारसी, पाली, उर्दू या भाषासुद्धा संशोधकांना नीट येत नाहीत.
यामुळे संशोधनात साचलेपण आले आहे.
प्रा. गिरीश मांडके
इतिहास संग्रहालयाचे अभिरक्षक
डेक्कन कोलेज, पुणे
शब्दांकन: संकेत कुलकर्णी
शिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र
in ऐतिहासिक पत्रे, मोडी शिका 12-05-15 19,834 Views
सदरचे
पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी
महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील
दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत.
पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते.
प्रतिपच्चंद्र
लेखेव वर्धीष्णूर्वि
श्र्ववंदिता|| शाह्सू
नो: शिवस्यैषा मुद्रा
भद्राय राजते||
१. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू बजानिब कारकुनानी
२. हाळ व इस्त्कबाळ व देशमुखानी प|| पुणे बिदानद के सुहूर सन समान अर्बेन
३. रवां सुद अलफ बो| माहादभट बिन मुद्गलभट पुरंदरे सेकीन
४. कसबे मजकूर हुजूर येऊन माळूक केले जे आपणास
५. बदल इमान दर माहाळ
६. जमीन देहाय गावगना चावर गजशरायेनी
७. ३
८. मौजे परवती देखील नख्तयाती व बाजे मौजे पिंपरी न|| रहाटणी बाबा महसूळे
९. बाबा पायेपोसी व पटिया हाळ व पेश्तर सी चावर
१०. देखील महसूळ कुळबाब कुळकानू मौजे पिंपळेसौदागर देखील महसूळ
११. चावर १ व नख्तयाती त|| ठाणे व त|| देहाय व पाये
१२. पोसी कुळबाब कुळकानू चावर १
१३. नख्त ब|| दिवाबती दर माहाळ जकायेती
१४. दरोज रुके 6३
१५. येणेप्रमाणे ब|| फर्मान हुमायुनु र|| खास व खुर्द्खत ममळकत मदार मळीक
१६. अंबर व भोगवटे वजीरानी व खु|| माहाराज साहेब ब|| सनद शुदा त|| साळ
१७. गु|| सन सबा चाळिळे आहे हाली साळ म|| कारणे दादाजी कोडदेऊ शुबे
१८. दार त्यासी देवाज्ञा जाली म्हणोनु माहाळी कारकून ताजिया खुर्दखताचा
१९. उजूर करितात दंरीबाब नजर एनायेत फर्माउनू सदरहू इनाम जमीन
२०. देहाय गावगना व नख्त रुके तीन दुमाळे करावया रजा होये बिनाबरा इळतमेसी खा
२१. तेरीसी आणौनी माहादभट बिन मुद्गलभट पुरंदरे यासी इनाम दरमा
२२. हाळ बित||
२३. जमीन देहाय गावगना चावर गजशरायनी
२४. तीन ३
२५. मौजे परवती दे|| नख्तयाती व बाजेबाबा मौजे पिंपरी न|| रहाटणी बाबा महसूळे
२६. व पायेपोसी व पटिया हाळ व पेश्तर देखी सी चावर १
२७. ळ महसूळ कुळकानू चा मौजे पिंपळेसौदागर देखीळ महसू
२८. वर १ ळ व नख्तयाती त|| ठाणे व त|| देहाय
२९. व पायेपोसी कुळबाब कुळकानू चावर
३०. १
३१. नख्त ब|| दिवाबती दर माहाळ जकाती प|| म||
३२. दरोज रुके ϭ३
३३. येणेप्रमाणे ब|| फर्मान हुमायुनु र|| खास व खुर्द्खत ममळकत मदार मलिकअंबर
३४. व भोगवटे वजीरानी व खु|| माहाराजसाहेब ब|| सनद शुदा त|| साळ गु||
३५. सन सबा चाळिळे असेली तेणेप्रमाणे मनासी आणौनी दुमाळे करणे दर हर
३६. साळ ताजिया खुर्दखताचा उजूर न करणे तालीक घेऊन असेली इनामदार
३७. मजकुरापासी फिराऊन देणे व रोजमुरा जकाती पैकी इ|| अवळ साळापासु[नु]
३८. घेत जाणे मोर्तब सूद मर्या देयं विरा जते
३९. रुजु सुरु
४०. निवीस
४१. तेरीख २६ माहे रजब
४२. जमादिलाखर सुरु सुद
शि.च.सा. खंड २, लेखांक २०
सनदपत्रातील माहिती पृष्ठ १११, १९ जुलै १६४७
पत्राचा अर्थ:
पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना शिवाजीमहाराजांच्या काचेरीकडून पत्र
१९ जुलै १६४७
महादभट मुद्गल पुरंदरे याने शिवाजीमहाराजांकडे येऊन सांगितले की,
मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी.
हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे.
दादाजी कोंडदेवांचा मृत्यूचा उल्लेख तारखेप्रमाणे म्हणजे १९ जुलै १६४७
पूर्वी झाला हे या पत्रावरून समजते. दादाजी कोंडदेवांच्या मृत्यूचा उल्लेख
असलेली शिवाजी महाराजांची तीन पत्रे उपलब्ध आहेत.
(राजवाडे खंड २० लेखांक २३७, शि.च.सा. खंड ३ लेखांक ५३०, खंड ८ लेखांक २१
या प्रत्रांतील उल्लेख करणारी भाषा दादाजी कोंडदेवांविषयी महाराजांना
वाटणारा आदर व्यक्त करणारी आहे.)
पत्रावरील टिपा:
१. रवां सुद म्हणजे रवाना झाले. हे रवान शुद या फार्सी वाक्यप्रचाराचा अपभ्रंश आहे.
२. दर म्हणजे आत. दर महाल म्हणजे महालावर, महालात. येथे महाल म्हणजे पुणे परगणा.
३. परवती म्हणजे पुणे शहरातील पर्वती ठिकाण.
४. न|| म्हणजे नजीकचा संक्षेप.
५. बाबा मह्सुलेसी म्हणजे महसूलासंबंधीच्या बाबींसह.
६. लग म्हणजे शून्य, काही नाही.
७. दर महाल जकाती म्हणजे जकातीच्या महालावर, जकातीच्या खात्यावर/तून.
८. रुके म्हणजे चलन, तांब्याचे नाणे – ४८ रुक्यांचा १ टका होत असे.
९. ब|| हा बरहुकुमाचा संक्षेप आहे.
१०. र|| खास हा रख्तखाना शब्दाचा संक्षेप आहे. निजामशाही फर्मानांची सुरुवात अज दिवान रख्तखाना खास शब्दांनी होत असे.
११. ममलकत मदार म्हणजे राज्याचा आधार, हा मलिकअंबराचा किताब आहे.
१२. भोगवटे वजीरानी म्हणजे वाजीरांनी दिलेल्या भोगवट्याच्या खुर्दखताप्रमाणे.
१३. ब|| सनद शुदा म्हणजे झालेले. सनदे नुसार आलेले.
१४. त|| हा तागायत म्हणजे पर्यंत पावेतो या शब्दाचा संक्षेप आहे.
१५. म|| हा मसुरल हजरत किंवा मसुरल अनाम, या उपाध्यांचा किंवा मसुरल (प्रसिद्ध). या शब्दांचा संक्षेप आहे.
१६. रोजमुरा म्हणजे दैनंदिनी, दररोज द्यायची रक्कम.
१७. इ|| हा इस्ताक्बालाचा संक्षेप आहे.
१८. अवल साला पासुनु म्हणजे वर्षारंभापासून, प्रथम असा अर्थ आहे.
साभार: शिवछत्रपतींची पत्रे – डॉ. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी
User Rating!
Summary : सदरचे पत्र अस्सल असून पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र
in ऐतिहासिक पत्रे, मोडी शिका 22-03-15 23,143 Views
पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र.
या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे.
हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही राजमुद्रा तसेच अखेरीस “मोर्तब” म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे.
या कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते.
शिवाजीमहाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिपव्यवस्थेकरीता असे
प्रतिवर्षी द्यावे आणि या खुर्दखताची एक नक्कल लिहून घेऊन हे अस्सल पत्र
वेदमूर्ती विनायकभट ठकार यांच्याकडे सुपूर्द करावे.
कसबा गणपतीच्या देवळाची पिढीजात मालकी ठकार घराण्याकडे असून त्या घराण्याच्या कागदपत्रांमध्ये हे पत्र मिळाले आहे.
पत्र पुढीलप्रमाणे:
***** पत्राची पुढील बाजू: ******
प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। —– श्री मोरया
(अ)जरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे बजानी(ब)
कारकुनानी क॥ मावल देहाये प॥ पु(णे)
(ण) बिदानद सु॥ सबा अर्बैन अलफ (बद)
ळ दिप देवस्थान श्री—- कसबे पुणे
(ये)थे तेल दरोज वजन 66॥ अधसेर रास प्रमाणे
(झा) छ २१ सफूर पासुनु दर हरसाल देत जाणे ताज्या
खु॥ उजूर न करणे तालिक होऊनु असेली खु॥ वेद(मुर्ती)
विनायकभट ठकार त्या पासी फिराऊनु देणे मोर्तब
– मर्यादेयं विराजते
***** पत्राची मागिल बाजू : *****
कागद उलटा करून तारिख दिली आहे-
तेरिख २१___________माहे सफुर
सफर_______________सुरु सुद
रुजू सुरु
निवीस
टीप:
१. पत्रात इंग्रजी 66 सारखे दिसणारे चिन्ह ही संख्या नसून तत्कालिन आकडेमोडितील रिक्त स्थान दाखवण्याची ती पद्धत आहे.
२. क|| – हा कर्यात शब्दाचा संक्षेप आहे.
३. बदळ दीप देवस्थान – मोडीमध्ये बऱ्याचदा ल ऐवजी ळ हे अक्षर लिहिलेले
असते, इथे बदळ च्या ऐवजी बदल वाचावे. बदल दीप देवस्थान म्हणजे देवस्थानच्या
दिव्याकरिता.
४. रास – गुरे, पाळीव जनावरे यांची संख्या सांगताना त्या संख्येपुढे रास असा फार्शी शब्द लिहित.
५. इ|| – हा इस्तकबाल या शब्दाचा संक्षेप आहे.
६. छ – छ हा चंद्र शब्दाचा संक्षेप आहे.
७. खु|| – हा खुर्दखताचा संक्षेप आहे.
संदर्भ: शिवछ्त्रपतींची पत्रे खंड १ – डॉ. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी
User Rating!
Summary : पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेले दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची "प्रतिपच्चंद्र" ही राजमुद्रा तसेच अखेरीस मोर्तब आहे.
कालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने
जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये शुहूर सन (अरबी कालगणना) फक्त अक्षरात लिहिलेला असते. त्याकरिता संख्यावाचक अरबी शब्द वापरलेले असतात. मराठी कागदपत्रांत ते मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. इंग्रजांचे राज्य सुरु झाल्यानंतरही बराच काळ अरबी कालगणना वापरात होती. सुहूर सन, फसली सन व हिजरी सन अशा तीन प्रकारांमध्ये ती पहावयास मिळते. पेशवे काळातील पत्रात सुहूर सनातील कागद प्रामुख्याने समोर येतात. सुहूर सनात साधारणतः ५९९ ते ६०० वर्षे मिळवल्यावर इसवीसन मिळते. मोडी पत्रांमध्ये महिनेही अरबी अक्षरात असतात. मोडी शिकू इच्छिणाऱ्यांसाठी अंक आणि बारा महिने खाली दिले आहेत. तसेच जुन्या कागदपत्रांमध्ये साधारणतः कालगणना सुहूर सनात असते व ती अक्षरांमध्ये दिसून येते.
सनाचे अरबी अंक डावीकडून उजवीकडे एकक, दशक, शतक, सहस्त्र असे वाचले जातात. यातील अलफ म्हणजे हजार हे बऱ्याच ठिकाणी अलफे असे लिहिलेले आढळते तरी मूळ शब्द अलफ असाच आहे. मराठी कागदपत्रांमध्ये अशर ऐवजी असर आणि इसरीन ऐवजी अशरीन, असरीन किंवा इसरैन असेही लिहतात. अहद या संख्यावाचक शब्दाऐवजी त्याचे इहिदे हे मराठी रूप येते. मोडी वाचता येणे हा पूर्णतः सरावाचा भाग आहे.
१ = इहीदे
२ = ईसने
३ = सलास
४ = अर्बा
५ = खमस
६ = सीत
७ = सबा
८ = समान
९ = तीसा
१० = अशर
२० = अशरीन
३० = सलासीन
४० = अर्बेन
५० = खमसैन
६० = सीतैन
७० = सबैन
८० = समानीन
९० = तीसैन
१०० = मया
२०० = मयातैन
३०० = सलास मया
४०० = अर्बा मया
५०० = खमस मया
६०० = सीत मया
७०० = सबा मया
८०० = समान मया
९०० = तीसा मया
१००० = अलफ
१ = मोहरम
२ = सफर
३ = रबिलावल
४ = रबिलाखल
५ = जमादिलावल
६ = जमादिलाखर
७ = रज्जब
८ = साबान
९ = रमजान
१० = सवाल
११ = जिल्काद
१२ = जिल्हेद
शुहूर सनाची संख्या लिहिताना अक्षरांमध्ये प्रथम एकं स्थानाचा आकडा, मग दहं स्थानाचा आकडा, मग शतक स्थानाचा आकडा, अशा क्रमाने लिहितात.
उदाहरणार्थ:
अर्बा खमसैन तिसामिया = ४ + ५० + ९०० = ९५४
अर्बेन अलफ = ४० + १००० = १०४०
खमस अर्बेन मयातैन अलफ = ५ + ४० + २०० + १००० = १२४५
जेष्ठ शुद्ध १३, शक १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला, या दिवसापासून राज्याभिषेक शक १ या वर्षास सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी नवीन कालगणना सुरु केली तरी राज्याभिषेक शकाचा मोडी कागदपत्रात उपयोग नियमित झालेला दिसत नाही. राज्याभिषेकानंतरच्या काही पात्रांवर राज्याभिषेक शक घातलेला असतो आणि काही पात्रांवर पूर्वीप्रमाणे शुहूर सन घातलेला असतो. शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधानांपैकी मोरेश्वर पंडितरायांच्या पत्रांवर राज्याभिषेक शक घातलेला दिसतो. शिवरायांच्या नंतरच्या छत्रपतींच्या कारकिर्दीतही स्वतः छत्रपती आणि त्यांचे पंडितराय यांच्याच पात्रांवर राज्याभिषेक शक घातलेला दिसतो.
राज्याभिषेक शक पत्रांचा मायना ठराविक पद्धतीचा असतो. प्रथम स्वस्ति श्री हे मांगल्यसूचक शब्द, मग राज्याभिषेक शक, संवत्सराचे नाव, महिना, पक्ष, तिथी व वार अशा क्रमाने तारीख, मग क्षत्रियकुलावतंस या उपाधीपुढे छत्रपतींचे नाव, त्यानंतर ‘याणी’ हा शब्द आणि त्यापुढे पत्र ज्याला लिहिले असेल त्याचे नाव, पद आणि मग यांसी आज्ञा केली यैसी जे अशा स्वरूपाचा मजकूर असतो.
मोडी वाचन – भाग ११
मोडी वाचन – भाग ११
मोडी वाचन – भाग ७
मोडी अक्षर ओ/औ/अं – (Modi Letter O/AU/AM)
मोडी वाचन – भाग ६
मोडी वाचन – भाग ५
मोडी वाचन – भाग ४
मोडी वाचन – भाग ३
मोडी वाचन – भाग २
मोडी वाचन – भाग १
Bharat Etihas Sanshidhak Mandal Pune - भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे
मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी
मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर
त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो
कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत
कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे
रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास
अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी
शिकलीच पाहिजे.
मराठी भाषेची जी काही आभूषणं आहेत त्यातील मोडी लिपी हे एक आभूषण. काही
काळापूर्वी हे आभूषण इतिहासजमा व्हायची वेळ आली होती; मात्र आता मोडी लिपी
अवगत व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं हा धोका
टळला आहे, असं म्हणता येईल अशी आशादायक परिस्थिती आहे. १९५० पर्यंत शालेय
अभ्यासक्रमात मोडी लिपीचा अंतर्भाव होता. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना
क्रमानं अवघड होत जाणाऱ्या वाचन मालिका अभ्यासायला असत. आता त्या केवळ
दुर्मिळ ग्रंथ म्हणून समजल्या जातात. एके काळी मोडी लिपी दैनंदिन जीवनात
वापरली जात होती. जमाखर्च, रोजनिशी, पत्रव्यवहार, सरकारी नोंदी, याद्या,
स्मरणं इत्यादींची टिपणं मोडीतच असत. मोडी लिपीची सुरवात बाराव्या शतकात
देवगिरीच्या यादवांच्या वैभवशाली काळात झाली. हेमाडपंत नावाचा यादवांचा
प्रधान होता, त्यानं ही लिपी सुरू केली असं मानलं जातं. देवनागरी लिपीत
अक्षरं लिहिताना लेखणी वारंवार उचलावी लागते व लिखाणाचा वेग मंदावतो.
पूर्वीच्या काळी सर्वच व्यवहार हातानं लिहूनच होत असत म्हणून सर्वदूर
पसरलेल्या साम्राज्यांतील पत्रव्यवहार जलद गतीनं व्हावा यासाठी देवनागरी
लिपीत सुधारणा करून त्यानं ही नवी लिपी तयार केली. हिची भाषा मराठी आहे;
परंतु लिपी मोडी. एकसंध रेषा काढून तिच्याखाली बोरूनं सलग अक्षरं लिहिली
जात असत. या लिपीतील काही अक्षरं देवनागरी अक्षरांप्रमाणे आहेत.
ऱ्हस्व-दीर्घादि फरक व विरामचिन्हं नसल्यामुळं जलद गतीनं या लिपीत लिखाण
करता येतं. परंतु मजकुरातील शब्द सलग लिहिलेले असल्यामुळे तो कोठे तोडल्यास
अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे ठरविणं सुरवातीला कठीण जातं, तथापि मोडीवाचन
हा मुख्यतः सरावाचा भाग आहे.
काळानुसार मोडी लिपीचे शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन व उत्तर
पेशवाई किंवा ब्रिटिशकालीन असे ढोबळ प्रकार दिसून येतात. शिवपूर्वकालीन आणि
शिवकालीन मोडी कागदपत्रं त्यातील जुनी भाषा आणि काही पर्शियन शब्दांच्या
वापरामुळं वाचावयास कठीण असत. परंतु पेशवेकालीन मोडीतील बरंचसं लेखन हे
सुबक, घोटीव, रेखीव आणि लपेटदार असल्यामुळं वाचनास सुलभ जातं. अव्वल
इंग्रजी काळात बोरूची जागा टाकानं घेतल्यामुळे अक्षरांचा आकार लहान झाला व
वाचन बरेचसं क्लिवष्ट झालं. इतिहास स्वतः वाचून खात्री करायची असेल,
इतिहासाची मूळ अस्सल साधनं पाहावयाची, सखोल अभ्यासावयाची तर मोडी उत्तम
प्रकारे आत्मसात करणं आवश्य क ठरतं.
ऐतिहासिक काळात विकसित होत होत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली ही मोडी
सध्या दुर्लक्षित झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाकरिता राज्यातील
दफ्तरखान्यात आणि संशोधन संस्थांमध्ये धुळीच्या साम्राज्यात असलेल्या लाखो
ऐतिहासिक कागदांचं वाचन होणं आवश्यनक आहे. हे कागद प्रामुख्यानं मोडी,
फारसी लिपीतील आहेत. राज्यात मोडीचे उत्तम जाणकार पंचवीसच्या वर नाहीत, असं
म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर
हिंदुस्थानातील ज्या ज्या प्रांतात मराठ्यांची सत्ता पोहोचली आणि स्थिरावली
अशा बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर, म्हैसूर आदी ठिकाणीही मोठ्या
प्रमाणात मोडी कागदपत्रं आढळतात. याशिवाय खासगी संशोधन संस्था आणि
व्यक्तिगत संग्रह यामधील कागदपत्रांची संख्या पुष्कळ आहे. पुणे
पुरालेखागारात पेशवे काळातील सर्वात जास्त कागदपत्रांचा संग्रह आहे. १५९०
ते १८६५ म्हणजे सुमारे २७५ वर्षांच्या कालावधीतील निरनिराळ्या
विषयासंबंधीचं वर्गीकरण केलेले ३९ हजार रुमाल (रुमाल म्हणजे एके ठिकाणी
सुमारे एक हजार ते बाराशे कागद) म्हणजे सुमारे ४ कोटी कागद आहेत. त्यात
शाहू दफ्तर, पेशवा दफ्तर, आंग्रे दफ्तर, जमाव दफ्तर, इनाम कमिशन, डेक्कन
कमिशन असे विभाग असून, दैनंदिन हिशेब, पेशव्यांच्या रोजकिर्दी, सरकारी
खजिन्याचे हिशेब, देणग्या, बक्षिसं, महसूल, तोफखान्याच्या संबंधीच्या
खर्चाचे हिशेब, संस्थानिकांची माहिती, वतने, इनामे, मुलखाच्या
बंदोबस्तासाठी केलेल्या व्यवस्थेसंबंधीची माहिती इत्यादी बाबींच्या नोंदी
आहेत.
मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे, दिल्ली, गोवा, हैदराबाद, चेन्नई इत्यादी ठिकाणी मोडी कागद मोठ्या प्रमाणात आहेत.
भारत इतिहास संशोधन मंडळात १५५० ते १९०० या कालावधीतील १५ लाख मोडी कागद
आहेत. त्यात रास्ते, मेहेंदळे, पुरंदरे, पटवर्धन, दाभाडे, नगरकर या
सरदारांची दफ्तरे, तसेच निरनिराळ्या संशोधकांनी ठिकठिकाणाहून आणलेली
कागदपत्रेही आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक
डॉ. ग. ह. खरे यांनी मोडीतील अस्सल साधने प्रसिद्ध करण्याची परंपरा
निर्माण केली. वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी मिरज मळ्यातील १८९६ ते १९२७
या कालावधीतील जवळजवळ ८ हजार कागदांतून ऐतिहासिक लेखसंग्रह
या ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ पानिपतोत्तर मराठी इतिहासाबद्दल आजही
प्रमाणभूत मानला जातो. शं. ना. जोशी, कृ. वा. पुरंदरे, द. वा. पोतदार, स.
ग. जोशी, द. वि. आपटे, पां. ना. पटवर्धन या संशोधकांचं इतिहासाप्रती असलेलं
योगदान अलौकिक असंच आहे. जुन्या कागदपत्रांतील संकेत (Protoco) आणि
संक्षेप (Shortform) अनेक दशकांच्या अभ्यासातून या संशोधकांनी
अभ्यासकांपुढे आणले. ग. ह. खरे यांचे संशोधकाचा मित्र, राजवाडे खंड (४०००
कागद), पेशवे दफ्तराचे ४६ खंड, वाड डायरी (पेशवे रोजनिशी), तसेच भारत
इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला व पुरस्कृत ग्रंथमाला
याअंतर्गत असलेले शिवचरित्र साहित्याचे १५ खंड (२००० कागद), शिवकाळातील
अभ्यासासाठी व शिवकालीन मोडी समजून घेण्यासाठी शिवचरित्र साहित्य खंडाचा
उपयोग होतो. पेठे दफ्तर, हिंगणे दफ्तर, वैद्य दफ्तर, गद्रे-सावकारांचे कागद
मंडळाने प्रकाशित केलेले आहेत. या ग्रंथातून मोडी लिपीतील इतिहासाची पाने
अभ्यासक व इतिहासप्रेमींसाठी या संशोधकांनी खुली केली. याचा मुख्य उपयोग
मोडी समजून घेण्यासाठी होतो.
हे सर्व ज्ञानभांडार अभ्यासकांची, वाचकांची वाट पाहात आहे. परंतु
दुर्दैवानं मोडी लिपीच्या शिक्षणाची सोय मात्र सर्व ठिकाणी उपलब्ध नाही.
पुणे पुराभिलेखागार आणि भारत इतिहास संशोधन मंडळ या दोन्ही संस्थांमार्फत
मोडी अभ्यास वर्गांचं आयोजन अत्यंत माफक शुल्क आकारून केलं जातं. या
संस्थांमध्ये शिकण्याचा फायदा असा, की मोडी लिपीतील अधिकृत कागद वाचावयास व
पाहावयास मिळतात. भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे दर दीड ते दोन महिन्यांनी
मोडी अभ्यास वर्ग घेतला जातो. कागद वाचताना काही अडल्यास ज्येष्ठ इतिहास
संशोधक गजानन मेहेंदळे यांचं मार्गदर्शन मिळतं.
इतिहास संशोधनाच्या आणि प्रामुख्यानं मोडी कागद वाचण्याच्या क्षेत्रात पुढे
येणाऱ्या अभ्यासकांसाठी व ज्यांना मोडी शिकल्यानंतर मोडी वाचावयास
येण्याची इच्छा आहे; परंतु काही कारणांनी ते मंडळामध्ये रोज वाचनाकरिता येऊ
शकत नाहीत त्यांच्यासाठी मी व मंदार लवाटे यांनी सोपी मोडी पत्रे हे
पुस्तक तयार केलं आहे. पुस्तकात डाव्या बाजूला मोडी पत्र व उजव्या बाजूला
पत्राचं देवनागरीतील लिपीतील रूप व कठीण शब्दांचे अर्थही दिलेले आहेत.
मोडी कागदपत्रांत लढाया, मोहिमा, राजकीय घडामोडींबरोबर आजही मनोरंजक
वाटेल अशी त्या त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन, सण-समारंभ, उत्सव
यांची तपशीलवार माहिती दिसून येते. स्त्री-पुरुषांची विविध प्रकारची
वस्त्रे- त्यात स्त्रियांच्या शालू, पैठण्यांपासून पुरुषांच्या पागोटे,
फेटा, विजार, अंगरखा इत्यादींचे दर आणि ती वस्त्रं कोठून आणली जात त्याचीही
माहिती उपलब्ध होते. त्याचप्रमाणे पायाच्या बोटापासून डोक्यांपर्यंत
म्हणजेच नखशिखांत वापरात असलेले स्त्रियांचे बाळ्या, बुगड्या, गोठ,
पाटल्या, नथ, पैंजण, मूद, राखाडी; तसेच पुरुषांचे कंठा, भिकबाळी, चौकडा,
पोहोची, अंगठी आणि लहान मुलांचे हसळी, बिंदली, गोठ असे असंख्य प्रकारचे
सोन्याचे, चांदीचे, जवाहिरी, मोत्याचे दागिने त्यांचे दर व वजनासह माहिती
पाहावयास मिळते. निरनिराळ्या सणांना, व्रतांना, पूजांना करण्यात आलेले
विविध पदार्थ, त्यात वापरले जाणारे साहित्य, त्यांचे दर याच्याही नोंदी
आहेत. विविध देवदेवतांच्या मूर्ती, त्यांना केलेले सोने, चांदी, हिरे,
मोती, वैडुर्य, पुष्कराज, हिरकण्या यांनी जडविलेले दागिने यांचेही वर्णन
पाहावयास मिळते. याबरोबरच पागा, पीलखाना, उष्ट्रखाना, रोजच्या वापरात
असलेल्या सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड इत्यादींपासून बनविलेल्या
वस्तूंची माहिती, त्यांची वजने, दर याही नोंदी आढळतात. विषयानुरूप संशोधन
करण्यासाठी अशा कागदांचा अभ्यास करणं आवश्यवक आहे.
भारताचा मध्ययुगीन आणि विशेषतः मराठी इतिहासास उपयुक्त असा राजकीय-
शासकीय व्यवहार, न्यायालयीन कागद, सावकारी किंवा जमीन-जुमल्यांच्या
संदर्भातील कागद, कालनिर्णय इत्यादी अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांची जाण
मोडी लिपीच्या अभ्यासाच्या आधारानंच होऊ शकेल.
मोडी लिपी हा आपला परंपरागत असलेला अमूल्य ठेवा आहे. देशातील आणि विशेषतः
महाराष्ट्रातील पुराभिलेखागारात आज मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे
लाखोंच्या संख्येनं नव्या अभ्यासकांची अजून वाट पाहात आहेत. त्यांच्या
अभ्यासानं इतिहास आणि संस्कृतीत फार मोठी भर पडू शकेल. परंतु मोडी वाचकांची
संख्या मात्र पाहिजे तशी वाढत नाही. ही संख्या वाढली नाही आणि नवे अभ्यासक
पुढे आले नाहीत तर इतिहासाच्या या महत्त्वाच्या साधनसामग्रीचा कालौघात नाश
होईल. ज्या ज्या महान संशोधकांनी या क्षेत्रात प्रचंड कार्य केलं ते
अतुलनीय आहेच; परंतु कागदपत्रांची संख्या पाहता हे काम अजून बरेच शिल्लक
आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महाविद्यालयीन व त्यानंतरच्या शिक्षणात
अनेक विभाग आहेत, की ज्यात विद्यार्थी नाहीत; पण शासनाचं त्यासाठी मोठं
अनुदान आहे. परंतु मोडीबाबत मात्र शासन गंभीर नाही. जागतिकीकरण, मोबाईल,
इंटरनेटच्या या जमान्यात मोडी लिपी रोजच्या व्यवहारात पुन्हा आपलं स्थान
प्राप्त करेल अशी शक्याता आज जरी नसली तरी तिची वैशिष्ट्यं, लकबी लक्षात
घेता ती इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कायमच महत्त्वाची आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी असलेलं तिचं नातं अबाधितच राहील
यात शंका नाही. गरज आहे ती या लिपीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मंडळींची;
कारण आपला इतिहास समजून घेण्याचा हा राजमार्ग आहे.
मोडी शिकणाऱ्यांसाठी
मोडी शिकण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन
मंडळात संपर्क करावा किंवा या लेखाच्या लेखिकेशी ई-मेलवर संपर्क साधावा.
मोडी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांची काही ठराविक संख्येइतकी नोंदणी झाल्यावर
संशोधन मंडळाच्या वतीने मोडी लिपी शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. अल्प दरात
शिकवल्या जाणाऱ्या या लिपी वर्गाचा आजपर्यंत अनेकांना लाभ झाला आहे.
– सौ. भास्वती सोमण (bhaswati.soman@gmail.com)
साभार: सकाळ टाईम्स
मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे.
मराठी भाषेची जी काही आभूषणं आहेत त्यातील मोडी लिपी हे एक आभूषण. काही काळापूर्वी हे आभूषण इतिहासजमा व्हायची वेळ आली होती; मात्र आता मोडी लिपी अवगत व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं हा धोका टळला आहे, असं म्हणता येईल अशी आशादायक परिस्थिती आहे. १९५० पर्यंत शालेय अभ्यासक्रमात मोडी लिपीचा अंतर्भाव होता. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना क्रमानं अवघड होत जाणाऱ्या वाचन मालिका अभ्यासायला असत. आता त्या केवळ दुर्मिळ ग्रंथ म्हणून समजल्या जातात. एके काळी मोडी लिपी दैनंदिन जीवनात वापरली जात होती. जमाखर्च, रोजनिशी, पत्रव्यवहार, सरकारी नोंदी, याद्या, स्मरणं इत्यादींची टिपणं मोडीतच असत. मोडी लिपीची सुरवात बाराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या वैभवशाली काळात झाली. हेमाडपंत नावाचा यादवांचा प्रधान होता, त्यानं ही लिपी सुरू केली असं मानलं जातं. देवनागरी लिपीत अक्षरं लिहिताना लेखणी वारंवार उचलावी लागते व लिखाणाचा वेग मंदावतो. पूर्वीच्या काळी सर्वच व्यवहार हातानं लिहूनच होत असत म्हणून सर्वदूर पसरलेल्या साम्राज्यांतील पत्रव्यवहार जलद गतीनं व्हावा यासाठी देवनागरी लिपीत सुधारणा करून त्यानं ही नवी लिपी तयार केली. हिची भाषा मराठी आहे; परंतु लिपी मोडी. एकसंध रेषा काढून तिच्याखाली बोरूनं सलग अक्षरं लिहिली जात असत. या लिपीतील काही अक्षरं देवनागरी अक्षरांप्रमाणे आहेत. ऱ्हस्व-दीर्घादि फरक व विरामचिन्हं नसल्यामुळं जलद गतीनं या लिपीत लिखाण करता येतं. परंतु मजकुरातील शब्द सलग लिहिलेले असल्यामुळे तो कोठे तोडल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल हे ठरविणं सुरवातीला कठीण जातं, तथापि मोडीवाचन हा मुख्यतः सरावाचा भाग आहे.
काळानुसार मोडी लिपीचे शिवपूर्वकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन व उत्तर पेशवाई किंवा ब्रिटिशकालीन असे ढोबळ प्रकार दिसून येतात. शिवपूर्वकालीन आणि शिवकालीन मोडी कागदपत्रं त्यातील जुनी भाषा आणि काही पर्शियन शब्दांच्या वापरामुळं वाचावयास कठीण असत. परंतु पेशवेकालीन मोडीतील बरंचसं लेखन हे सुबक, घोटीव, रेखीव आणि लपेटदार असल्यामुळं वाचनास सुलभ जातं. अव्वल इंग्रजी काळात बोरूची जागा टाकानं घेतल्यामुळे अक्षरांचा आकार लहान झाला व वाचन बरेचसं क्लिवष्ट झालं. इतिहास स्वतः वाचून खात्री करायची असेल, इतिहासाची मूळ अस्सल साधनं पाहावयाची, सखोल अभ्यासावयाची तर मोडी उत्तम प्रकारे आत्मसात करणं आवश्य क ठरतं.
ऐतिहासिक काळात विकसित होत होत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली ही मोडी सध्या दुर्लक्षित झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाकरिता राज्यातील दफ्तरखान्यात आणि संशोधन संस्थांमध्ये धुळीच्या साम्राज्यात असलेल्या लाखो ऐतिहासिक कागदांचं वाचन होणं आवश्यनक आहे. हे कागद प्रामुख्यानं मोडी, फारसी लिपीतील आहेत. राज्यात मोडीचे उत्तम जाणकार पंचवीसच्या वर नाहीत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर हिंदुस्थानातील ज्या ज्या प्रांतात मराठ्यांची सत्ता पोहोचली आणि स्थिरावली अशा बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर, म्हैसूर आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणात मोडी कागदपत्रं आढळतात. याशिवाय खासगी संशोधन संस्था आणि व्यक्तिगत संग्रह यामधील कागदपत्रांची संख्या पुष्कळ आहे. पुणे पुरालेखागारात पेशवे काळातील सर्वात जास्त कागदपत्रांचा संग्रह आहे. १५९० ते १८६५ म्हणजे सुमारे २७५ वर्षांच्या कालावधीतील निरनिराळ्या विषयासंबंधीचं वर्गीकरण केलेले ३९ हजार रुमाल (रुमाल म्हणजे एके ठिकाणी सुमारे एक हजार ते बाराशे कागद) म्हणजे सुमारे ४ कोटी कागद आहेत. त्यात शाहू दफ्तर, पेशवा दफ्तर, आंग्रे दफ्तर, जमाव दफ्तर, इनाम कमिशन, डेक्कन कमिशन असे विभाग असून, दैनंदिन हिशेब, पेशव्यांच्या रोजकिर्दी, सरकारी खजिन्याचे हिशेब, देणग्या, बक्षिसं, महसूल, तोफखान्याच्या संबंधीच्या खर्चाचे हिशेब, संस्थानिकांची माहिती, वतने, इनामे, मुलखाच्या बंदोबस्तासाठी केलेल्या व्यवस्थेसंबंधीची माहिती इत्यादी बाबींच्या नोंदी आहेत.
मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे, दिल्ली, गोवा, हैदराबाद, चेन्नई इत्यादी ठिकाणी मोडी कागद मोठ्या प्रमाणात आहेत.
भारत इतिहास संशोधन मंडळात १५५० ते १९०० या कालावधीतील १५ लाख मोडी कागद
आहेत. त्यात रास्ते, मेहेंदळे, पुरंदरे, पटवर्धन, दाभाडे, नगरकर या
सरदारांची दफ्तरे, तसेच निरनिराळ्या संशोधकांनी ठिकठिकाणाहून आणलेली
कागदपत्रेही आहेत. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक
डॉ. ग. ह. खरे यांनी मोडीतील अस्सल साधने प्रसिद्ध करण्याची परंपरा
निर्माण केली. वासुदेव वामनशास्त्री खरे यांनी मिरज मळ्यातील १८९६ ते १९२७
या कालावधीतील जवळजवळ ८ हजार कागदांतून ऐतिहासिक लेखसंग्रह
या ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ पानिपतोत्तर मराठी इतिहासाबद्दल आजही
प्रमाणभूत मानला जातो. शं. ना. जोशी, कृ. वा. पुरंदरे, द. वा. पोतदार, स.
ग. जोशी, द. वि. आपटे, पां. ना. पटवर्धन या संशोधकांचं इतिहासाप्रती असलेलं
योगदान अलौकिक असंच आहे. जुन्या कागदपत्रांतील संकेत (Protoco) आणि
संक्षेप (Shortform) अनेक दशकांच्या अभ्यासातून या संशोधकांनी
अभ्यासकांपुढे आणले. ग. ह. खरे यांचे संशोधकाचा मित्र, राजवाडे खंड (४०००
कागद), पेशवे दफ्तराचे ४६ खंड, वाड डायरी (पेशवे रोजनिशी), तसेच भारत
इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला व पुरस्कृत ग्रंथमाला
याअंतर्गत असलेले शिवचरित्र साहित्याचे १५ खंड (२००० कागद), शिवकाळातील
अभ्यासासाठी व शिवकालीन मोडी समजून घेण्यासाठी शिवचरित्र साहित्य खंडाचा
उपयोग होतो. पेठे दफ्तर, हिंगणे दफ्तर, वैद्य दफ्तर, गद्रे-सावकारांचे कागद
मंडळाने प्रकाशित केलेले आहेत. या ग्रंथातून मोडी लिपीतील इतिहासाची पाने
अभ्यासक व इतिहासप्रेमींसाठी या संशोधकांनी खुली केली. याचा मुख्य उपयोग
मोडी समजून घेण्यासाठी होतो.
हे सर्व ज्ञानभांडार अभ्यासकांची, वाचकांची वाट पाहात आहे. परंतु
दुर्दैवानं मोडी लिपीच्या शिक्षणाची सोय मात्र सर्व ठिकाणी उपलब्ध नाही.
पुणे पुराभिलेखागार आणि भारत इतिहास संशोधन मंडळ या दोन्ही संस्थांमार्फत
मोडी अभ्यास वर्गांचं आयोजन अत्यंत माफक शुल्क आकारून केलं जातं. या
संस्थांमध्ये शिकण्याचा फायदा असा, की मोडी लिपीतील अधिकृत कागद वाचावयास व
पाहावयास मिळतात. भारत इतिहास संशोधन मंडळातर्फे दर दीड ते दोन महिन्यांनी
मोडी अभ्यास वर्ग घेतला जातो. कागद वाचताना काही अडल्यास ज्येष्ठ इतिहास
संशोधक गजानन मेहेंदळे यांचं मार्गदर्शन मिळतं.
इतिहास संशोधनाच्या आणि प्रामुख्यानं मोडी कागद वाचण्याच्या क्षेत्रात पुढे
येणाऱ्या अभ्यासकांसाठी व ज्यांना मोडी शिकल्यानंतर मोडी वाचावयास
येण्याची इच्छा आहे; परंतु काही कारणांनी ते मंडळामध्ये रोज वाचनाकरिता येऊ
शकत नाहीत त्यांच्यासाठी मी व मंदार लवाटे यांनी सोपी मोडी पत्रे हे
पुस्तक तयार केलं आहे. पुस्तकात डाव्या बाजूला मोडी पत्र व उजव्या बाजूला
पत्राचं देवनागरीतील लिपीतील रूप व कठीण शब्दांचे अर्थही दिलेले आहेत.
मोडी कागदपत्रांत लढाया, मोहिमा, राजकीय घडामोडींबरोबर आजही मनोरंजक वाटेल अशी त्या त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन, सण-समारंभ, उत्सव यांची तपशीलवार माहिती दिसून येते. स्त्री-पुरुषांची विविध प्रकारची वस्त्रे- त्यात स्त्रियांच्या शालू, पैठण्यांपासून पुरुषांच्या पागोटे, फेटा, विजार, अंगरखा इत्यादींचे दर आणि ती वस्त्रं कोठून आणली जात त्याचीही माहिती उपलब्ध होते. त्याचप्रमाणे पायाच्या बोटापासून डोक्यांपर्यंत म्हणजेच नखशिखांत वापरात असलेले स्त्रियांचे बाळ्या, बुगड्या, गोठ, पाटल्या, नथ, पैंजण, मूद, राखाडी; तसेच पुरुषांचे कंठा, भिकबाळी, चौकडा, पोहोची, अंगठी आणि लहान मुलांचे हसळी, बिंदली, गोठ असे असंख्य प्रकारचे सोन्याचे, चांदीचे, जवाहिरी, मोत्याचे दागिने त्यांचे दर व वजनासह माहिती पाहावयास मिळते. निरनिराळ्या सणांना, व्रतांना, पूजांना करण्यात आलेले विविध पदार्थ, त्यात वापरले जाणारे साहित्य, त्यांचे दर याच्याही नोंदी आहेत. विविध देवदेवतांच्या मूर्ती, त्यांना केलेले सोने, चांदी, हिरे, मोती, वैडुर्य, पुष्कराज, हिरकण्या यांनी जडविलेले दागिने यांचेही वर्णन पाहावयास मिळते. याबरोबरच पागा, पीलखाना, उष्ट्रखाना, रोजच्या वापरात असलेल्या सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड इत्यादींपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती, त्यांची वजने, दर याही नोंदी आढळतात. विषयानुरूप संशोधन करण्यासाठी अशा कागदांचा अभ्यास करणं आवश्यवक आहे.
भारताचा मध्ययुगीन आणि विशेषतः मराठी इतिहासास उपयुक्त असा राजकीय-
शासकीय व्यवहार, न्यायालयीन कागद, सावकारी किंवा जमीन-जुमल्यांच्या
संदर्भातील कागद, कालनिर्णय इत्यादी अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांची जाण
मोडी लिपीच्या अभ्यासाच्या आधारानंच होऊ शकेल.
मोडी लिपी हा आपला परंपरागत असलेला अमूल्य ठेवा आहे. देशातील आणि विशेषतः
महाराष्ट्रातील पुराभिलेखागारात आज मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे
लाखोंच्या संख्येनं नव्या अभ्यासकांची अजून वाट पाहात आहेत. त्यांच्या
अभ्यासानं इतिहास आणि संस्कृतीत फार मोठी भर पडू शकेल. परंतु मोडी वाचकांची
संख्या मात्र पाहिजे तशी वाढत नाही. ही संख्या वाढली नाही आणि नवे अभ्यासक
पुढे आले नाहीत तर इतिहासाच्या या महत्त्वाच्या साधनसामग्रीचा कालौघात नाश
होईल. ज्या ज्या महान संशोधकांनी या क्षेत्रात प्रचंड कार्य केलं ते
अतुलनीय आहेच; परंतु कागदपत्रांची संख्या पाहता हे काम अजून बरेच शिल्लक
आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये. महाविद्यालयीन व त्यानंतरच्या शिक्षणात
अनेक विभाग आहेत, की ज्यात विद्यार्थी नाहीत; पण शासनाचं त्यासाठी मोठं
अनुदान आहे. परंतु मोडीबाबत मात्र शासन गंभीर नाही. जागतिकीकरण, मोबाईल,
इंटरनेटच्या या जमान्यात मोडी लिपी रोजच्या व्यवहारात पुन्हा आपलं स्थान
प्राप्त करेल अशी शक्याता आज जरी नसली तरी तिची वैशिष्ट्यं, लकबी लक्षात
घेता ती इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कायमच महत्त्वाची आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी असलेलं तिचं नातं अबाधितच राहील
यात शंका नाही. गरज आहे ती या लिपीचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या मंडळींची;
कारण आपला इतिहास समजून घेण्याचा हा राजमार्ग आहे.
मोडी शिकणाऱ्यांसाठी
मोडी शिकण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन
मंडळात संपर्क करावा किंवा या लेखाच्या लेखिकेशी ई-मेलवर संपर्क साधावा.
मोडी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांची काही ठराविक संख्येइतकी नोंदणी झाल्यावर
संशोधन मंडळाच्या वतीने मोडी लिपी शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. अल्प दरात
शिकवल्या जाणाऱ्या या लिपी वर्गाचा आजपर्यंत अनेकांना लाभ झाला आहे.
– सौ. भास्वती सोमण (bhaswati.soman@gmail.com)
साभार: सकाळ टाईम्स
मोडी बाराखडी
Review Overview
User Rating !
Summary : मोडी बाराखडी मोडी शिकणाऱ्यांसाठी.. मोडी शिकण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन संस्थेत संपर्क करावा किंवा या लेखाच्या लेखिकेशी ई-मेलवर संपर्क साधावा. मोडी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांची काही ठराविक संख्येइतकी नोंदणी झाल्यावर संशोधन मंडळाच्या वतीने मोडी लिपी शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. अल्प दरात शिकवल्या जाणाऱ्या या लिपी वर्गाचा आजपर्यंत अनेकांना लाभ झाला आहे. - सौ. भास्वती सोमण (bhaswati.soman@gmail.com)
मोडी लिपी काय आहे?
मोडी लिपीचा इतिहास
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी(ब्राह्मी)चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही.
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी अल्पप्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७००च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.
मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात. देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्लिश भाषाशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.
मराठी लेखनाबद्दल ज्ञानेश्वरांनी खालील ओळीत उल्लेख केला आहे.
१) हे बहु असो पंडीतु, धरुणु बालकाचा हातु, वोळी लेहे वेगवंतु, आपणाची॥ (ज्ञानेश्वरी अध्याय १३, ओवी क्र.३०७)
२) सुखाची लिपी पुसिली ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३, ओवी क्र.३४६)
३) दोषांचीं लिहिलीं फाडीं ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ४, ओवी क्र.५२)
४) आखरे पुसलिया ना पुसे, अर्थ जैसा ॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ८, ओवी क्र.१७४)
इ.स. १८०१ मध्ये विल्यम कॅरे या मिशनऱ्याने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी लिथोग्राफ, श्रीरामपूर बंगालयेथे बनवला.
‘रघु भोसल्यांची वंशावळी, ‘मराठी भाषा व्याकरण’,’मराठी कोष’, ‘नवा करार’ (१८०७). या ग्रंथांची मोडी लिपीत छपाई केली गेली.
ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मराठी बायबल मोडी लिपीत छापले.
ए.के. प्रियोळकर यांनी मोडी छपाईचा इतिहास लिहिला.
मोडी लिपीचे चार कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे – यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन.
यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली
गेली. तीच, शिवकालीन शैलीय किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला
तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती
शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी
लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन
शैलीत मोडी अगदीच सुंदर, रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ
लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात
इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला
जाडी-रुंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने
मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची, किचकट आणि कुरूप दिसून लागली. फाऊंटन पेनचा
एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे
मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात
काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून त्यांत असलेली लिपी, ही मोडी लिपी शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात नस्तलीक मधून शिकस्ते लिपी जन्मास आली. शिकस्ता म्हणजे मोडकी नस्तलीक. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे नागरी, गुर्जरी(म्हणजे महाजनी) आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे. गुजराथी आणि बंगाली भाषा या सुरुवातीला देवनागरी लिपीत लिहिल्या जात, परंतु तेथील भाषाभिमान्यांनी हट्टाने वेगळ्या लिपीची उभारणी करून ती वापरण्यास सुरुवात केली.
मोडी वळणे
चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी.
मोडी लिपीतील असंख्य दस्तऐवज हे खाली दिलेल्या ठिकाणी संग्रहित केले आहेत.
सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर, तामिळनाडू
कॉनेमारा ग्रंथालय, मद्रास युनिव्हर्सिटी, चेन्नई, तामिळनाडू
संग्रहालय: लंडन, पॅरिस, नेदरलँड्स, स्पेन वगैरे
भारत इतिहास संशोधक मंडळ ,पुणे
राजवाडे संशोधन मंडळ, धुळे
मोडीचे प्रशिक्षण व पुस्तके
मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे, ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
तुम्हीच मोडी शिका या नावाचे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक – ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्तऐवज छापलेले आहेत.
जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई येथे मोडीचे प्रगत वर्ग घेतले जातात.
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे मोडीचे वर्ग घेतले जातात.
महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाद्वारे दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते.
या कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन
व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा
संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती
उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते.
संदर्भ: Wikipedia मोडी लिपी



































































































































No comments:
Post a Comment