Monday, February 19, 2024

हॉटेल जाधवगड

अठरावे शतक म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील वैभवशाली अन् देदीप्यमान असा कालखंड. स्वराज्याच्या रोपट्याची चांगली जोपासना करून पहिले बाजीराव पेशवे यांनी मराठी सत्ता झपाट्याने महाराष्ट्राबाहेर रोवली आणि मराठी भीमथडी तट्टांनी अरबी घोड्यांना बाजूला सारून आपल्या टापांनी हिंदुस्थानावरची मुघलांची मगरमिठी सोडविली ती याच कालखंडात. रणधुरंधर पाहिले बाजीराव व त्यांच्यासारखेच अनेक रणवीर उदयास आले तेही याच कालखंडात! शिंदे, होळकर, पवार, भोसले अन् कितीतरी! यातच एक मोठे पराक्रमी, शूर आणि जिकडे तिकडे दरारा निर्माण करणारे सरदार होते - पिलाजीराव जाधवराव.

    जाधवरावांच्या इतिहासात खोलवर उतरल्यावर जाणवते की हे मूळचे यादव राय. देवगिरी आणि सिंदखेड ह्या दोन्ही ठिकाणी यादवरायचे उल्लेख आहेत. पुढे सिंदखेडच्या यादवरायचे जाधवराव झाले. ह्याच कुळातील पिलाजीराव जाधवराव हे शाहू महाराजांच्या सैन्यात सरदार होते. अंगचे शौर्य आणि तलवारीचे पाणी ह्याच्या जोरावर त्यांनी शाहूराजांच्या सेवेत बरीच मर्दुमकी गाजवून ते राजांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात पोहोचले. २१ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढून आलेल्या शाहूराजांना गादीवर बसविण्यात पिलाजीरावांचा सिंहाचा वाटा होता. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना सासवड, मल्हारगाव(?) आणि आसपासची काही गावे जहागीर म्हणून मिळाली. सरदार पिलाजी जाधवरावांनी १७१० साली सासवडपासून जवळच हा गड बांधला. आपले कुटुंब आणि खजिना शत्रूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा गड बांधण्यात आला. पिलाजीराव जाधवराव हे लखोजीराव जाधवराव (जिजाऊ साहेबांचे वडील) यांचे वंशज. इ.स. १७१७ मध्ये दामाजी थोराताने पेशवा बाळाजी विश्वनाथास हिंगणगावच्या गढीमध्ये बंदिस्त केले. त्यावेळी मोठ्या हिमतीने पिलाजींरावांनी हिंगणगावावर चाल करून ती गढी जमीनदोस्त केली आणि दमाजी थोरातास छत्रपती शाहू महाराजांपुढे आणले. त्याबद्दल शाहू महाराजांनी पिलाजीराव यांना पुणे प्रांती मौ. दिवे आणि मौ. नांदेड गाव इनाम म्हणून दिले. (जे आता नांदेड सिटी म्हणून ओळखले जाते.) त्या ठिकाणी त्यांनी एक वाडा बांधला.
श्री शाहू छत्रपतीनी पिलाजीरावांना सासवडजवळही जमीन दिली होती. वाघोलीचा हा वाघ आपल्या पराक्रमाने शाहू छत्रपतींच्या नजरेत भरला नि दिवे गावाजवळील मोठ्या जमिनीच्या इनामाचा मानकरी झाला. वाघोलीच्या कुशीतील 'पिलाजी' दिवे घाटातील माळरानावर आपली 'गुहा' बनूवन 'राव' बनले! वाडी बसविली गेली आणि सरदार पिलाजीरावांच्या कल्पनेतून इ. १७०७ ते १७१२ च्या दरम्यान एका भव्य नि बळकट वास्तूने आकार घेतला. तीच ही जाधवांची गढी!सरदार पिलाजीराव हे पांडुरंगाचे भक्त होते. हे त्यांच्या शिक्यावरून दिल्य त्यांच्या शिक्का असा.
  श्री. पांडुरंग चरणी
  दृढभाव। चांगोजीसुत
पिलाजी जाधवराव
     पंढरीच्या पंढरीरायाबरोबरच त्यांची समशेरीवरही फार भक्त होती अने दिसते. बाळाजी विश्वनाथ, तसेच पहिले बाजीराव यांच्याबरोबरीने अनेक लढ्यात त्यांनी तलवार गाजविली. त्रिंबकराव दाभाडे, दामाजी थोरात इत्यादींचा त्यांन बीमोड केलाच, पण १७२९ मध्ये उत्तर हिंदुस्थानात महंमदखान वंगष यांच्याशी झालेल्या लढाईत त्यांनी खूप पराक्रम गाजविला. जाधवराव झाले ते यावेळेस 'राव' हा किताब त्यांना मिळाला. सन १७६० मध्ये निधन झाल्यानंतर 'वाघोली'स त्यांची समाधी बांधली गेली.
 तसेच वाघोलीमध्ये असणाऱ्या श्री वाघेश्वर महादेव मंदिराजवळ पिलाजीराव जाधव यांची स्मरण छत्री आहे, ती सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण त्यांचा नांदेड सिटी मधला हा वाडा मात्र तसा अपरिचित आहे.



 सिंहगड रोडवर धायरी फाट्यावरचा उड्डाण पूल ओलांडून पुढे गेल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला नांदेड सिटीचे प्रवेशद्वार लागते. त्या दरवाज्यातून आत गेल्यावर आपण नांदेड चौकात पोचतो. तिथे पिलाजीरावांच्या स्मरणार्थ एक देखणे समूह शिल्प उभारले आहे. त्या समूह शिल्पाला वळसा घालून डाव्या हाताच्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर आपण सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांच्या भव्य वाड्यासमोर येतो.
वाड्याची तटबंदी, सुरेख महादरवाजा आणि तिथे डौलाने फडकणारा जरीपटका आपल्याला इतिहास काळात घेऊन जातात. महादरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूच्या भिंतीवर असणारी राजे लखुजीराव जाधवराव, सरसेनापती पिलाजीराव जाधवराव आणि सरसेनापती धनाजीराव जाधवराव यांची शिल्पे आणि पिलाजीराव जाधवराव यांची मुद्रा आपले लक्ष वेधून घेते. बाजूलाच असणाऱ्या दालनात जाधवराव घराण्यातील व्यक्तींची चित्रे, ऐतिहासिक शस्त्रास्त्रे, जाधवराव घराण्याची वंशावळ आणि इतर अनेक गोष्टी सुंदर रीत्या जपून मांडल्या आहेत. तिथे समोर असणाऱ्या डौलदार घरामध्ये मात्र आपल्याला जाता येत नाही. सध्या त्या वाड्यात राहणाऱ्या श्री. विक्रम सिह जाधवराव यांनी त्या वाड्याचे मूळ स्वरूप तसेच ठेऊन अप्रतिम वास्तू संवर्धन केले आहे.
पत्ता :
https://goo.gl/maps/NSBpSs674ZJhigzt5
 
पिलाजीराव जाधवांनी इ.स. १७१० मध्ये बांधलेल्या या ऐतिहासिक गडाचे एका हॉटेलमध्ये रूपांतर केल्या गेले असून महाराष्ट्रातील हे एकमेव हेरिटेज हॉटेल आहे. ह्याला 'गड' असे म्हटले, तरी 'रायगड', 'सिंहगड' यासारखे हे भव्यदिव्य प्रस्थ नाही. भुईकोट किल्ला किंवा एखादी गढीच म्हणा ना! हा गड आणि आजूबाजूचा १५ एकराचा परिसर ही जाधव घराण्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे. जाधवगडाचे आजचे मालक श्री. सूरसिंह जोत्याजीराव जाधवराव आणि श्री. अमरसिंह जोत्याजीराव जाधवराव. पैकी श्री. सूरसिंह हे महाराष्ट्र सरकारात आमदार होते, तर श्री. अमरसिंह हे गोवा मुक्तिसंग्रामात सक्रिय होते.जाधवगढी ही माजी मंत्री दादा जाधवराव ( जनता दल ) यांची वैयक्तिक मालकी च राहत घर होते. २००५ च्या आसपास लागलेल्या प्रचंड आगीत ही गढी जळाली. नंतर वर्तमानपत्रात बातमी आल्यानंतर हाँटेल ऊद्योजक विठ्ठल कामत यांनी तिथे भेट घेतली. त्यांची हेरीटेज रीसाँर्टची कल्पना दादा जाधवराव आणि जि. प. सदस्य बाबा जाधवराव यांना समजून सांगितली.त्यांनी नंतर ह्या राहत्या घरा चे रूपांतर प्रचंड भांडवल टाकुन ऊत्कृष्ट अतिमहागड्या रेसाँर्ट मधे केले. जाधवगड हा शासनाच्या मालकीचा नसून ती जाधवरावांची वंशपरंपरागत खाजगी मालमत्ता आहे तसेच जाधवगड हा किल्ला नसून जाधवरावांचा राहता खाजगी वाडा आहे, जो त्यांनी हेरिटेज हॉटेल विठ्ठल कामत यांना भाडे तत्वावर दिला आहे म्हणुन तो त्यांनी विकसीत केला आहे
हा किल्ला कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सला देण्यात आलेला असून लग्न समारंभ वगैरेसाठी तो इ.स.२००८ पासून भाडे तत्वावर दिला जातो. श्री. विठ्ठल कामतांनी ही सारी वास्तु खुप चांगली कलात्मक दृष्टीकोन ठेवुन सजवली आहे, त्यांची कलात्मकता, कल्पकता ठाई ठाई आढळुन येते. रंगसंगती, वस्तुंची माडंणी, केवळ लाजबाब. प्रत्येक कोपरा नं कोपरा काही तरी दाखवत असतो, सांगत असतो.

1
     हॉटेल जाधवगड हे सासवड-नारायणपूर रस्त्यावर पुण्यापासून ४० कि.मी.वर आहे. ह्याला 'गड' असे म्हटले, तरी 'रायगड', 'सिंहगड' यासारखे हे भव्यदिव्य प्रस्थ नाही. भुईकोट किल्ला किंवा एखादी गढीच म्हणा ना! हा गड आणि आजूबाजूचा १५ एकराचा परिसर ही जाधव घराण्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे.
     पुणे-सासवड रस्त्यावरील दिवे घाटाची सुंदर वळणे घेत एसटी सासवडकडे धावू लागते, अन् गाडीतील प्रत्येकाची नजर ही गढी वेधून घेते. तिबेटमधील 'पोटाला पॅलेस' सारखी भासणारी जाधवांची गढी दिसू लागताच एकदम मनात येते की, पाहावे जाऊन गढी म्हणजे काय प्रकार आहो तो! अनेकजण तसेच पुढे-सासवड-पुरंदरला फक्त जातात आणि इतक्या जवळ असलेल्या सुंदर गढीकडे फिरकतच नाहीत.मुख्य रस्त्यातून गडाकडच्या रस्त्याकडे वळण घेतानाच दोन्ही बाजूला दोन चौक्या दिसतात ज्यावर मराठी व इंग्रजी असे जाधवगडाचे बोर्ड दिसतात व त्यावर हॉटेलचे ब्रीद वाक्य आहे "लढ, झगड, आगे बढ..... "
    खरे म्हणजे गढी दिसते एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखी, पण भुईकोट किला आणि गढी यांत बराच फरक आहे.
भुईकोट किला म्हणजे एखाद्या सपाट प्रदेशातील सर्वात महत्वाचे लष्करी ठाणे, लष्करी दृष्ट्या तो भक्रमात भक्कम केलेला असतो. त्या दृष्टीने त्यांतील निवासस्थाने ही केवळ लष्करी शिपायांची घरटी असतात, सुखसोयीचा भाग त्यांत कमी असतो. याउलट गढ़ी म्हणजे राहण्याचा वाडा! यास संरक्षणासाठी बाजूने तट उभारलेले असतात. यामुळे गढ़ी ही ज्या त्या सरदाराच्या श्रीमंतीनुसार सुखसोयींनी युक्त पण संरक्षित अशी उभारलेली असते.
जाधवरावांची गढी मुख्यतः राहण्यासाठी बांधलेली असली तरी ती अतिशय मोक्याच्या जागी आहे व तेथून दिवेघाट नजरेच्या टप्प्यात असल्यामुळे त्याची नाकेबंदी येथून करणे सहज शक्य होत असे. येथून मल्हारगड, पुरंदर हे किले जवळ आहेत, याच गोष्टीचा फायदा हिंगणगावच्या दामाजी थोरातांनी ही गढ़ी बळकावून पुरंदरची मोर्चेबंदी करण्यासाठी घेतला. त्यांनी पुरंदर ते पुणे हा सर्व प्रदेश मारून काढलाच, इतकेच नव्हे तर बाळाजी विश्वनाथास सुप्याकडे जात असताना पकडले होते.
आणि म्हणूनच पुढे छत्रपती शाहू महाराजांनी याचा उल्लेख पुण्यास पेशवे शनवारवाडा बांधत असताना त्यांना विरोध करण्यासाठी दरबारात असा केला.
"पूर्वी पिलाजी जाधव वाडा बांधीत होते, तेव्हा आम्ही मनाई करीत होतो. परंतु राजश्री चंद्रसेन जाधवराव थोरातांची पाठ राखीत. यामुळे वाडीस कोट जाला. (म्हणजे जाधवगढी) शेवटी राजश्री बाळाजीपंत धरिले. तेव्हा तीच वाढी पुरंदरास मोर्चा जाहला व मुलुख हैराण जाहला. आम्ही सांगत होतो ते न ऐकिले. शेवटी त्याच गोष्टीस आले तसेच हेही कर्म आहे."
दरेवाडी, तासगाव, सांगली, कन्हाड येथेही अशाच प्रकारच्या गळ्या आहेत. पण जाधवरावांची गढ़ी ही सर्वात जास्त बळकट आणि सामर्थ्यशाली आहे, याची साक्ष आपल्याला तिच्या भव्य दरवाज्यात पाऊल टाकताच पटते. सुमारे २२५'-२००' अशा मापात, काटकोनाकृती असलेल्या या गढीला बाहेरची एक
व आतील एक अशा दोन तटबंद्या आहेत. अशी रचना दुसऱ्या कोणत्याच गढीला नाही. ७०'-८०' उंचीचे भक्कम तट आणि त्यातील ठिकठिकाणी, बंदुकांचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या पाहून एका शक्तीचे, आव्हानाचे, सामर्थ्याचे आणि मराठ्यांच्या विजीगिषू वृत्तीचे दर्शन आपल्याला घडते.
1





गढीचा मुख्य दरवाजा पुण्याच्या शनिवारवाड्याप्रमाणे नगारखान्याने सुशोभित झाला आहे. दरवाज्यातून आत पाऊल टाकताच तिथल्या वातावरणामुळे आपण एकदम इतिहास-काळात जातो. दोन्ही बाजूंना दोन अशा पहारेकऱ्यांसाठी देवड्या येथे आहेत. दरवाज्याला एक जुन्या पद्धतीचे कुलूप होते.
  आता मात्र या गढीचे रुपांतर हॉटेलमध्ये झाल्यावर बरेच बदल झाले आहेत. हॉटेलच्या आवारात शिरल्यावर तिथले 'मावळे' तुमच्या गाडीचा आणि सामानाचा ताबा घेतात. तुम्ही मोकळ्या हाताने गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे प्रस्थान ठेवता.गड पाहण्यासाठी प्रत्येकी १००० रुपयाचे कुपन घ्यावे लागते. काही पायऱ्या चढून गडाच्या मुख्य दरवाजातील स्वागत कक्षाकडे निघावे.मात्र गडाच्या बाह्य आणि अंतर्भागातल्या दगडी पायर्‍या ८ ते १० इंच उंच आहेत. आधारासाठी हँडरेलसुद्धा नाहीत. तुमचे वजन जास्त आणि गुडघ्यांचे दुखणे असेल , तर जाता-येता, चढता-उतरता ब्रह्मांड आठवते.



महाद्वारावर तुतार्‍यांनी आणि ढोल-ताशांनी तुमचे स्वागत होते. लई भारी वाटते, राव! मुख्य दरवाज्यापाशी पोहचल्यावर नगारा वाजवण्यास सुरुवात होते.आत शिरल्यावर तुमच्या कपाळी कुंकुमतिलक लावला जातो आणि तुमच्या मनावर राजेशाही थाट राज्य करू लागतो.

प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर दोन्ही बाजूस देव्हड्या आहेत. येथे काही पुरातन वस्तू ठेवलेल्या आहेत. स्वागतिका आपल्याला खोलीच्या किल्ल्या आणि खोली दाखवायला, सामान वर न्यायला एक साहाय्यक देते. इथल्या पायर्‍या फारच उंच आहेत त्यामुळे ते सोयीचे ठरते.

दरवाज्यातून आत जाऊन डावीकडे वळून पायऱ्या चढल्या की, सुरेख अंगण लागते. समोरच तटाला लागून दक्षिणोत्तर दिशेत अनेक मोठमोठ्या खोल्या आढळतात. याच्यावरही अशा अनेक खोल्या आहेत. खोल्यांच्या तुळ्यांना लाकडावर सुरेख नक्षीकाम केलेले आधार दिलेले आहेत. त्यावर दोन कमळे व इतर पान-फुलांची नक्षी आढळते.
उजवीकडे दुसरा दरवाजा लागतो आणि त्यानंतर पायऱ्या चढून जाताच पूर्वाभिमुख असलेल्या तिसऱ्या दरवाज्यात आपले पाऊल पडते.
हवेली खरोखरच अतिशय देखणी आहे. या तीन मजल्यांची भव्यता आणि बांधणी आकषून घेते, यात वादच नाही. दरवाज्यातून आत जाताच एक उघडा चौक लागतो. या भागात हवेलीचा एक मोठा भाग होता. पण दुर्दैवाने भांडणात त्याची राख होऊन गेली. या चौकाच्या चारी कोपऱ्यांत एकएक टाके आहे. यात पावसाचे पाणी साठते. एक वृंदावनही आपले लक्ष वेधून येते.
भिंतीतल्या जिन्याने वरती गेल्यावर दोन तीन दालने लागतात. यांतील भिंतीतून असणारे कोनाडे विशिष्ट प्रकारचे असून त्यात सुरेख आकृत्या चितारल्या आहेत. तसेच श्रीराम, श्रीकृष्ण इ. देवादिकांची चित्रे व इतर चित्रे चितारलेली आढळतात.
या वरच्या मजल्यावरची दालने म्हणजे अस्मानी महालच म्हटले पाहिजेत. भिंतीवरील हिरव्या रंगातील फुलाफुलांची सुंदर नक्षी आणि दोन दालनांमधील भिंतीत बसविलेली मोर कोरून काढलेली लाकडी जाळी प्रेक्षणीय आहे. याच दालनात एक कारंजे पण बसविले आहे. इतक्या उंचीवरच्या दालनात कारंजे करण्याची कल्पना मोठी नामी आहे. शिवछत्रपतींनी रायगडावरील आपल्या राजप्रासादातील मनोऱ्यांतून कारंज्यांची अशीच योजना केलेली दिसते. पण त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा जाधवगढीतील होय. इथे दालनाच्या छताशी एक टाकी तयार केलेली आहे. त्यातून नळी काढून ती भिंतीतून नेऊन कारंज्यास जोडलेली आहे. अशा रीतीने वक्रनलिकेच्या तत्त्वावर उडणारे हे कारंजे, गवाक्षातून येणारा आल्हाददायक वारा, बाहेर दिसणारे आसमंताचे सुरेख दृश्य. सायंकाळचा वेळ रम्यपणे घालिवण्यास आणखी काय पाहिजे? दालनाला जोडूनच असलेल्या सज्जातून बाहेरचे दृश्य तर आल्हाद देतेच पण भिंतीवरील अप्रतिम व नावीन्यपूर्ण रंगीत नक्षी बघूनही मन प्रसन्न होते. या दालनाच्या शेजारच्या खोलीत एक पाण्याचे टाके आहे. पावसाच्या पाण्याला चुन्यातील नळावाटे यात वाट करून दिली असे सांगतात. पण पाण्याची ही योजनाअभ्यास करण्याजोगी आहे खरी!

1

1
 



   आता गढीचे रुपांतर हॉटेलमध्ये केल्यावर खोल्या पर्यटकांसाठी रुपांतरीत केल्या आहेत, काही खोल्या नीटनेटकी आणि स्वच्छ आहेत. बाथरूम, सामान ठेवण्याची व्यवस्था, तिजोरी वगैरे व्यवस्था चांगली आहे. सर्व सामान व्यवस्थित लावून तिथेच सेवेसाठी ठेवलेल्या चहा-कॉफीचा आस्वाद घेता येतो. अर्थात काही खोल्यांना अडचणी आहेत, खोलीला एकही खिडकी नाही. ४ इंच X ६ इंच आकाराचे झरोके काचेने बंद केलेले आहेत. त्यामुळे खोलीत चांगला एसी असूनही घुसमटल्याची भावना होते.
    यानंतर दादऱ्याने म्हणजे भिंतीतल्या जिन्याने वरती गच्चीत जाताच चौफेर प्रदेश दिसतो. ही गढीतील सर्वात उंच जागा. अशा रीतीने चारपाच मजले चढून येथे येईपर्यंत गढीच्या वास्तुशिल्पाने पहिल्या दरवाज्यापासून एका पाठोपाठ एक अनेक संरक्षक फळ्या उभ्या करून गढी लष्करी दृष्ट्या बळकट केली आहे. त्यामुळे इथे येईपर्यंत आपण चक्रावून जातो.
पूर्वेकडे दिसणारा मल्हारगड, आग्रेयेस जेजुरी, साधारण दक्षिणेस पुरंदर, वज्रगड, उत्तरेकडे दिसणारी दिवेघाटाची रांग पाहून गढीच्या मोक्याच्या जागेची यथार्थ कल्पना येते. बाजूचे हिरवेगार शेत आणि कन्हेपठारावरचा भन्नाट वारा आपल्याला काही वेगळाच आनंद देतो.

1
   हॉटेलच्या तरणतलाव  फारच नयनरम्य वगैरे म्हणता येईल असा आहे. मात्र तरणतलावात संगीत नाहीये, तसेच वेळ समजण्यासाठी भिंतीवर घड्याळही नाही. तरणतलावाकाठी खानपान सेवाही नाही. अल्कोहोल मनाई आहे. पाण्याचे तापमान नियंत्रित आहे, ते एक सुख म्हणायचे. हॉटेलच्या स्पा, इंटरनेट आदी सेवा सशुल्क आणि महाग आहेत.
   गडाबाहेर खाण्यापिण्याची कुठेही व्यवस्था नाही. राहायची व्यवस्था  हाफ-बोर्ड (नाश्ता आणि राहणे) तसेच फुल बोर्ड (राहणे, नाश्ता, दोन वेळचे जेवण आदी) अश्या दोन प्रकारच्या आहेत. आपल्याला सोयीची व्यवस्था घेता येते.

 गढीत श्री. विठ्ठल कामत यांनी एक अप्रतिम  खाजगी संग्रहालय केलयं. खुप छान आहे ते. अगदी आवर्जुन पहाण्यासारखे.खाजगी असले, तरी पाहण्यासाठी सर्वांना उपलब्ध असते. छायाचित्रणाला मनाई आहे. संग्रहातील वस्तू, शिरस्त्राणे, अडकित्ते, स्वयंपाकघरातील भांडी, वगैरे वगैरे अनेक वस्तू पाहावयास मिळतात. पैकी पितळेचा उभा कुकर, दगडी खल, पितळी देव-देवता इ.इ.
 
1
गढीच्या मागच्या बाजुला रहाण्यासाठी तंबु ठोकले आहेत, हे तंबूही तुम्हाला हवे असल्यास मिळतात. पण भाडे तेवढेच आहे, जेवढे हॉटेलच्या खोलीचे. फरक काही नाही. शिवाय वरील छत वगळता बाकी भिंती सिमेंट-काँक्रीटच्याच आहेत त्यामुळे तंबूचा म्हणावा तसा आभास निर्माण होत नाही. हॉटेलात ४२ खोल्या आणि १२ तंबू आहेत. मस्तपैकी हिरवळ केली आहे. ती जागा मस्त आहे. मागे एक पारंबेदार वटवॄक्ष सावली धरुन उभा आहे. बाजूलाच व्यवस्थित निगा राखलेली आणि आकर्षक रचना केलेली हिरवळ आहे. हिरवळीवर व्हॉलीबॉल, क्रिकेट यासारखे खेळ तिथले कर्मचारी खेळत असतात. रोजचा व्यायाम होतो, टीमवर्क अंगी बाणवते आणि कार्यस्थळी उत्साही वातावरण टिकून राहते. व्यवस्थापनाचा हा प्रयोग अत्यंत सकारात्मक आहे.ह्या कर्मचार्‍यांच्या खेळात तुम्हीही सामील होऊ शकता. किंवा तुमच्याजवळ पूर्ण संघ असेल, तर तुम्ही स्वतंत्र सामना खेळू शकता.






1

1

 तिथेच झाडांना झोके बांधलेले आहेत. मस्त झोके घ्या, हिरवळीवर लोळा, देवदर्शन घ्या, नाहीतर पक्षी, फूलपाखरे ह्यात मन रमवा. खर्‍या अर्थाने मन आणि शरीर ताजेतवाने होऊन जाते. ताज्यातवान्या शरीराला मात्र सारखी भूक लागते. जेवणाच्या टेबलवर पुन्हा एकदा सामिष आणि निरामिष जेवण तुमचे जिव्हालौल्य शमविते. कॅफेटेरियामध्ये वाफाळता चहा, मिश्र भजी, चीज चिली टोस्ट तसेच नाश्त्याला इडली, डोसा, पोहे, उपमा वगैरे पदार्थ असतात शिवाय फळे आणि फळांचे ताजे रससुद्धा मिळतात. चहा-कॉफी तर असतेच असते.  जिथे आपण  नाश्ता आणि जेवायला बसतो त्या हॉटेलच्या सज्जातून, आजूबाजूचा परिसर मस्त दिसतो. 
1

1

1
 
 जेवणात शाकाहारात भरली वांगी, पिठले-भाकरी, मसालेभात होता, तर मांसाहारात सावजी कोंबडी, कोल्हापुरी  तांबडा रस्सा मटण वगैरे चविष्ट पदार्थ मिळतात. मिष्टान्न म्हणून अतिशय सुंदर, माफक गोड बासुंदी, अप्रतिम. श्रीखंड-पुरीसुद्धा स्वतःचा ठसा मनावर (आणि पोटावर) उमटविण्यात यशस्वी होते. जाधवगडावर खाण्यापिण्याची रेलचेल आहे. कमरेचा कसा जरा ढिला करावा लागतो. (जरा?.... असो.) मात्र पंचतारांकीत रेस्टारंटमधल्या जेवणात जी एक "डेलीकसी, नजाकत " असते किंवा एक जे वेगळेपण असते ते येथे नाही. जेवणात किंमतीच्या मानाने वैविध्य कमीच आहे, डेझर्ट मधे केवळ दोनच प्रकारचे मुस व एक आईस्क्रीम. 
जेव्हढा खर्च होतो तो पुरेसे समाधान मिळवून देत नाही. शिवाय, स्पा, वाय-फाय ह्या सेवा सशुल्क आहेत. आणि कित्येक सोयी सुविधा, खेळ, करमणूक वगैरे वगैरे फक्त शनिवार-रविवारच असते. म्हणजे इतर दिवशी फारच रुक्ष आहे.भरपूर खर्च करायची मानसिक तयारी असेल, तर जरूर जरूर भेट द्यावी असे आहे......
1

जर वेळ असेल तर आपण आजुबाजुला ट्रेकिंगला जाउ शकतो इथे ३०० वर्षे जुने देऊळ आहे.ट्रेकच्या वाटेवर हरणे, माकडे दिसतातच, शिवाय कोल्हे दिसतात, शिवाय केकारवही कानावर येतो.भरपूर फूलझाडांनी आणि इतर विविध वनस्पतींनी वेढलेला परिसर, पक्ष्यांचा किलबिलाट आणि देवळातील घंटानाद - शहरातील धावपळीच्या दैनंदिन जीवनातून तुम्हाला एका अफलातून निवांत आणि प्रसन्न जगात घेऊन जातो.

1

1

1

 
मागे एक पारंबेदार वटवॄक्ष सावली धरुन उभा आहे.

  गड उतरून बाहेर गेल्यावर गडाच्या बाहेरील भिंतीला लागून एक रस्ता जाधववाडीत जातो. इथे रस्त्याच्या एका बाजूला जाधवगडाची बाह्य भिंत, तर दुसर्‍या बाजूला झेंडूच्या फुलांचे मळे दिसतात. ठरावीक अंतरावर असणार्‍या ग्रामीण घरांच्या अंगणात गायींचे गोठे आहेत. सकाळ उजाडताना अर्ध्यामुर्ध्या अंधार-उजेडात गावकरी चरव्या भरभरून गायीचे दूध काढत असतात. शहरातील हे दुर्मीळ दृश्य इथे पावलापावलावर दिसते. गढीच्या मागील बाजूस एक गणेशमंदिर व मोठे तळे आहे. गणेश मंदिराचे खांब यादवकालीन धाटणीचे आहेत. गढीच्या पुढील बाजूस एक विठ्ठलमंदिर आहे. यातच एक चोवीस हातांची गारेची महिषासूरमर्दिनीची मूर्ती आहे. हिचे शिल्प आणि भाव सुरेख आहेत. ही मूर्तिही दरेकरांनीच दिली असावी. गढीच्या पूर्व बाजूस व तटाबाहेर एक विहीर आहे. जाधवरावांच्या घरातून या विहिरीत एक भुयारी मार्ग आहे.
    गढी पाहण्यास जाणाऱ्यांनी देवघर तर अवश्य पाहिलेच पाहिजे. विष्णु, अंबिकादेवी, यांच्या गारेच्या मूर्ती व इर अनेक मूर्ती येथे आहेत. या मूर्तीची घडण उत्तर हिंदुस्थानी पद्धतीची आहे. सरदार पिलाजीराव उत्तरेस वारंवार जात असत. तेव्हा परत येते वेळी अंबिकेची सुबक मूर्ती त्यांच्या नजरेस पडली आणि त्यांनी तात्काळ त्या मूर्तीच्या भारंभार सोने मूर्तिकारास देऊन तिला इकडे आणली, आणि अंबिकादेवी जाधवरावांच्या देवघरांत विराजमान झाली असे सांगतात. माळशिरस जवळील 'आमळे' गावचे सरदार खंडेराव दरेकर यांना तर निरनिराळ्या मूर्ती आणण्याची विलक्षण आवड होती. उत्तरेतून त्यांनी बऱ्याच मूर्ती इकडे आणल्या. दरेकर आणि जाधवराव हे तर एकमेकांचे अतिशय जवळचे आणि त्यामुळेच दरेकरांनी विष्णु-मूर्ती जाधवरावांना अर्पण करून त्यांच्या देवघरात ती स्थापिली असावी. देवघरातच काही जुने ताम्रपट, शिक्के, जुनी शस्त्रे व पोथ्या ठेवलेल्या आहेत.असे हे पिलाजीराव, देवघरातील मूर्ती आणि गढीच्या रूपाने चिरंजीव झाते आहेत.
भविष्यकाळात आपल्या रहात्या वाड्‍याचे काय होणार आहे याची जरासी, पुसटशी कल्पना देखिल पिलाजीराव जाधवांना आली असेल काय ? साऱ्या सासवड परिसरावर दरारा राखुन असलेल्या, दिवेघाटावर नियंत्रण ठेवलेल्या या "जाधवगढी ’ चे रुपांतर कधीकाळी "जाधवगढ " मधे होईल याचा अंदाज त्यांना ओझरता तरी आला असेल काय ? काळाचा महिमा अगाध आहे.

संदर्भ:
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) आव्हान -आनंद पाळंदे
३) पिलाजी जाधवराव यांची मराठेशाहीतील कामगिरी – डॉ. सुवर्णलता जाधवराव
४) इतिहासकर्ते मराठे - श्री. ग. ह. खरे
५) दर्याराज कान्होजी आंग्रे - श्री. सदाशिव शिवदे
६ ) मुठेकाठचे पुणे - श्री. प्र. के. घाणेकर
 ७ ) http://harekrishnaji.blogspot.com/2010/03/blog-post.html


An evening at Jadhav Gadh

Hello All,

After a very long time I am here. May be from now onwards will be regularly writing the reviews about the events or sites those I have visited. I will also be uploading some photos and useful links.

So this morning I woke up to think about a resort where I can spend my pleasant evening and thankfully my wife suggested about Jadav Gadh.

History

The story of Fort Jadhavgadh starts from the man who was as strong in mind and body as the stone structure he created. Pilaji Jadhavrao was the Maratha General in the army of Chhatrapati Shahuji. In 1707, Chhatrapati Shahuji, the grandson of the great Chhatrapati Shivaji, was released after 21 years of imprisonment by the Mughal ruler Shahjahan.

For more information, visit: About fort.

The fort is now transformed into a resort where you can spend a day or two. It's a quite a pleasant place to spend the day with your partner. Yes, without children it will be great, but with children accompany somebody along to look after them. Otherwise, you can spoil the stay.

Resort

The resort is located at Hadapsar Saswad Road, Jadhavwadi, Pune, Maharashtra 412301. If you are a localite, then there won't be any problem in finding the resort. However, if you are outstation, the most popular place is Hadapsar. From there you can find the easy road towards the fort.

Here is the google location map.

Pros-Cons

Everything has a pros and cons and you will have to accept those. Somewhere you also have to adjust as per the surroundings.

Pros:

  • Location: As this is a fort, you can expect calm and resources full environment.
  • Road: The main road is good enough with four lane highway.
  • Climate: Much of the resort is open sky, but climate depends on the visiting season. Ideal during the month of Summer or Winter season.
  • Food: The quality is good and they serve barbeque style, both veg and non-veg along with drinks.
  • Arrangements: The resort is also wide enough for big party events where they have the resources for it, like speakers, stage, buffet dinner/lunch, and so on.
  • Activities: Not very interesting activities are there except for the swimming pool for children and adults, but that's the way the fort is. You go there to relax and have good food. You can also enjoy the spa.

Cons:

  • Road: The highway road is a bit clumsy and the road towards the fort is in very bad shape, though the distance is very less.
  • Cost: The cost seems to be unexpectedly high.
  • Management: The people either, at the gate where you pay, do not have the appropriate information. If you have to visit and just view the fort, you have to take a package.
I went there with my camera and took some photos.



















Thank You.

For more information, please visit http://www.fortjadhavgadh.com/

Comments/Suggestions/Queries are most welcome.

http://9tipsforsearchengineoptimization.blogspot.com/


















 


 











No comments:

Post a Comment

मनसर

 प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...