Monday, February 19, 2024

मल्हारगड

  महाराष्ट्रात जवळपास चारशे किल्ले आहेत.विवीध राजवटीत हे गड, किल्ले बांधले गेले. महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगड किल्ला प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे गावातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याचे बांधकाम हे इ .स. १७६३ ते १७६५ या काळात झाले. पेशव्याचे तोफखान्याचे प्रमुख भीमावर पानसे व कृष्णराव पानसे यांनी गावच्या उत्तरेकडील डोंगरावर याची निर्मिती केली म्हणून याला सोनोरीचा किल्ला असेही म्हणतात.महाराष्ट्रातील काही किल्ले पिकनिक स्पॉटस बनलेत मात्र काही किल्ले इतिहास उगाळीत आपले शेवटचे काही क्षण मोजत आहेत. असाच चाकोरीबाहेरील एक किल्ला म्हणजे किल्ले सोनोरी उर्फ मल्हारगड. 



मल्हारगढ़ किला पुणे भारत - किला मल्हारगढ़ - एक हवाई दृश्य
   सोनोरी उर्फ मल्हारगडाला जाण्यासाठी विवीध पर्याय आहेत.
  १)  पुण्यापासून साधारण ३० किमी अंतरावर तर दिवे घाटापासून १०-१२ किमी अंतरावर मल्हारगड आहे.  गडावर यायला आणखी एक वाट आहे. पहिली वाट म्हातोबाची आळंदीकडून छातीवर येणारी कर ही दूसरी वाट पायें मोकळे करायला, पहाटे फिरायला जाताना होईल इतपत दमणूक करणारी दिवे घाट संपल्यावर डावीकडे झेंडेवाडी गाव आहे. झेंडेवाडीतून एक खिंड पार केल्यावर सोनोरीचे दर्शन होते. झेंडेवाडीतून अल्पशा चढणीनंतर खिंडीत पोहोचले की मल्हारगडाकडे जाणारी ढोरवाट पकडावी. अर्ध्यापाऊण तासातच थेट गडावर!
दुरून दिसणारा मल्हारगड 

२) मल्हारगडावर जाण्याचा सर्वात सोपा मार्ग सोनोरी गावातून जातो. सासवडच्या अलीकडे सोनोरी गाव आहे. सोनोरी गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते.सासवड पासून ६ कि.मी. वर सोनोरी हे गाव आहे. सोनोरी गावातून समोरच दिसणारा मल्हारगड आपले लक्ष वेधून घेतो. सोनोरी गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. गडाची उंची फारशी नाही १० ते १५ मिनिटात गडमाथा गाठता येतो. 
Malhargad Fort (also known as Sonori Fort)
Malhargad Fort (also known as Sonori Fort)
Malhargad fort from Base
Malhargad fort from Base
३) तसेच हडपसर-सासवड -जेजुरी या मुख्य महामार्गापासून सोनोरी गावाकडे जाण्यासाठी काळेवाडी फाटा लागतो. तो आपल्याला थेट मल्हारगडच्या मागच्या बाजूला घेऊन जातो. दक्षिणेकडील पडलेल्या बुरूजापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. काळेवाडी गावातून जाणारा हा रस्ता फारसा परिचित नसला तरीही अतिशय सोपा आहे. रस्ता थोडा कच्चा असला तरी देखील सहज किल्ल्याच्या बुरुजापर्यंत आपल्याला सहज घेऊन जातो. मल्हारगडच्या पायथ्यापासून फक्त ५ मिनिटांच्या चढाईनेच आपण किल्ल्यात प्रवेश करतो.
20180324_091502

Descending from Other side of Malhargad Fort
४) चौथ्या मार्गे आता फारसे कोणी येत नाही.गडाच्या उत्तर पायथ्याशी पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरचे आळंदी (पूर्वचे चोराची आळंदी व आता म्हातोबाची आळंदी) हे स्थानक आहे आता तर पी.एम.टी. कमांकाची बस दिवसातून पाचदा या आळंदीपर्यंत येते. येथून गडाच्या महादरवाज्यापर्यंत दगडी बांधणीची फरसबंदी बाट गेली आहे. या वाटेने आता फारशी वर्दळ राहिली नाही, त्यामुळे ही वाट सलग राहिली नसली तरी आळंदी गावाहून गडाच्या दिशेन जाउ लागलो कि ओढा लागतो मग रेल्वेचा जुना लोहमार्ग लागतो त्यानंतर डोंगर सोंडेवर जाणारी जुनी वाट लागते. गडालगतच्या खिंडीत पोहोचलो की, कन्हेपठार अन् देखणा पुरंदर व वज्रमाळ दिसतात. उजवीकडचा थोडा चढ चढला की, डोंगराला आरपार पडलेले भोक ऊर्फ नेढे लागते. नंतर गडाचा पहिला दरवाजा आपले स्वागत करतो.
   गडावर येणारे हे निरनिराळे मार्ग बघीतल्यावर आपण गडाच्या इतिहासात डोकावूया. 
 पेशवाईचा दरारा वाढविण्याचे मुख्य काम तोफखान्याचे प्रमुख या नात्याने, भीवराव पानसे यांनी केले. त्यांचे कायम वस्तीचे गाव दिवे घाटातील सोनपुरी ऊर्फ सोनोरी ! पानशांचे मूळ आडनाव पानसी. पानसे घराण्याचे मूळ पुरुष गोविंदपंत १६ व्या शतकाच्या आगेमागे केव्हातरी महाराष्ट्र देशी आले ते कर्नाटक प्रांतातून पण ते सोनोरीस स्थायिक झाले. भीवराव पानसे हे त्यांचे पुतणे, फालुन वद्य ७ शके १७००रोजी पहाटे सोमवारी मराठ्यांच्या तोफखानाप्रमुखाचा सोनोरील अंत झाला. त्यांची स्त्री उमाबाई सती गेली. त्यांच्या पोटी संतान नव्हते. त्यांचा निवंश झाला. सध्या सोनोरी गावालगत पांडुरंग काळयांच्या शिवारातील भीवकुंडाजवळच सरदार भीवराव यशवंतराव पानसे यांच्यावर फाल्गुन वद्य नवमीला अंत्यसंस्कार झाले. त्या जागी त्यांचे स्मारक उभारलेले आहे. त्याची दुरवस्था पाहून मन खिन्न होते. (आता हे स्मारक गढीजवळ हलवले आहे.)
   त्या काळी दिवेघाटासून गाड्यांची थोडीबहुत थे-जा होती, परंतु पुण्याहून सासवडला जाणाऱ्या या वर्दळीवर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात एकही किल्ला बांधण्यात आलेला नव्हता, गावच्या व दिवे घाटाच्या संरक्षणासाठी हा भीवराव पानसे व त्यांचे चुलत बंधू माधवराव कृष्ण पानसे यांनी सोनारी गावाजवळच्या एका डोंगरावर किल्ला बांधण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे भटाकडून पुहूर्त काढून अगदी ती वेळ साधत कामाला सुरुवात केली.  
वास्तुशिल्पी, बेलदार आधीचा राबता सुरु झाला मुहूर्त झाला आणि कुदळी फावडी- शिखरावर पडू लागले. असे सांगतात की, एका ठिकाणाहून रक्त वाहू लागले.ते पाहून तिथे खोदकाम करणारे कामगार घाबरले, खंडोबारायाचा आपल्यावर कोप झाला आहे असे त्या भोळ्याभाबडचा जीवांना वाटले. त्यांनी आपापली अवजारे तिथेच टाकून दिली आणि सोनोरी गावातील पानश्यांच्या वाड्याकडे धाव घेतली,  पायाचे काम अर्धवट सोडून सरदार पानसे यांना सांगावा गेला आणि झालेल्या घटनेवर चर्चा रंगल्या. तोडगे सुचविले गेले. शास्रार्थ धांडोळले गेले.आणाभाका घेतल्या.बांधकामाच्या पहिल्याच दिवशी असे अघटित घडले हे ऐकून उभयता पानसे बंधू चिंताक्रांत हले. आता पुढे करायचं काय?  सरदार पानसे यांना स्मरण झाले ते कर्हे पठाराच्या स्वामींचे 'मल्हारी म्हाळसाकांत श्री खंडेरायाचे ! त्यांनी भक्तिभावाने हात जोडले. राज्यरक्षणाच्या उभारल्या जाणार्या दुर्गाला श्री खंडोबाचं नाव देण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. असे सांगतात की, त्यानंतर हे संकट टळले. रक्तस्त्राव थांबला. आणि पुढे अगदी निर्विघ्नपणे किल्ल्याचे बंधकार पार पडले, नंतर पानसे बंधूनी बोललेला नवस फेडत नव्या गडावर खंडोबाचे एक देऊळही बांधले आहे. या घटनेमुळे किल्ल्याचे नामकरण झाले 'किल्ले मल्हारगड' ! सोनोरी गावानजीक हा गड असल्याने याला 'किल्ले सोनोरी' असेही म्हणतात    वरील दंतकथेला ऐतिहासिक साधनांमधून दुजोरा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. पण आजही सरदार पानश्यांनी बांधलेले श्रीमल्हारी मार्तंडाचे मंदिर गडावर आहे.
सरदार पानसे यांनी उभारलेल्या या किल्ल्यावर शिबंदी ठेवण्यासाउं पेशवे सरकारांनी त्यांना वार्षिक तीन हजार रुपयांची नेमणूक दिल्याची नोंद आढळते. तसेच सन १७७१-७२ मध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे या दुर्गाचे अवलोकन करण्यासाठी आले असल्याची नोंद आढळते. या किल्ल्याभोवती नाव घेण्यासारखी जरी लढाई झाली नव्हती तरी, पुढे उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावात याचा उपयोग, आश्रयार्थ झाल्याचे आढळते.

मल्हारगड उर्फ सोनोरीचा नकाशा

मल्हारगड प्रशस्त आणि मोकळा ढाकळा आहे. गडाची माची साधारण त्रिकोणाकृती आहे आणि त्यावर असलेला बालेकिल्ला चौकोनी आहे. गडाचा घेर फारच आटोपशीर आहे बाहेरील तटाचा घेर ७०० मीटर  साधारणपणे पाऊण किलोमीटर भरेल. हा आकार साधारणतः त्रिकोणी अहे. ४-५ मीटर उंचीचा हा किल्ल्याचा तट आहे, तर आतील बालेकिल्ल्याचा २ मीटर चंचीचा आहे  माचीची आणि गडाची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असल्यामुळे गडाचं गडपण नजरेत भरतं. मुख्य प्रवेशद्वार दोन बुरुजांनी वेढलेलं आहे. लागूनच आत, पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात.चिरेबंदी बांधणीची कमान, आतील देवड्या यांची रया गेली आहे. तसेच थोडे पुढे आले की दुसरा दरवाजा लागतो तो आपणास थेट बालेकिल्ल्यातच नेतो. बालेकिल्ल्यांच्या भिंतीची पडापड झाली आहे.
20180324_074257







प्रवेशद्वारातून बालेकिल्ल्यावर जाताना वाटेत सदरेचे अवशेष दिसतात. पुढे एक विहीरही दिसते. बालेकिल्ला उजवीकडे ठेवत तटाच्या बाजूनं फेरी सुरू करायची. पुढे एक पाण्याचं टाकं आणि विहीर लागते.उन्हाळ्यात पाण्याचा साठा संपून जातो. पावसाळ्याच्या शेवटी मात्र हिरव्यागार रंगाचे पाणी या बांधीव तलावात असते. या पाण्यात अनेक त-हेची अल्गी आढळतात. परंतु त्याने काही फारसा अपाय होत नाही. मात्र शिवनिर्मित किल्ल्यांवर आढळणारे पाण्याचे वैपुल्य आणि तटोतटी बांधलेले शौचकूप येथे नाहीत. 
 थोड्या अंतरावर बालेकिल्ल्याच्या मागच्या बाजूला एक कोरीव तळे आहे. तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकाला एक बुरुज दिसतो. याच बुरुजावरून समोर आम्हाला काळेवाडी/झेंडेवाडीतून येणार रस्ता दिसतो.
या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर एक चोर दरवाजा दिसतो. पुढे चालत गेल्यावर किल्ल्याच्या माचीवर नेणारा एक दरवाजा आणि तटबंदीला लागूनच असलेला बुरुज दिसतो. या बुरुजाच्या डाव्या बाजूने पुढे, बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे.







20180324_074734
From here, we could see Saswad and few villages. Also on the right side, Purandar and Vajragad forts can be seen. We turned left and saw a well. It must be filled up with water during rainy season.
20180324_075356
Moving ahead, we saw the Saffron flag. This is the highest point on the fort.
20180324_082003
Views from the top.
Walking further, there are remnants of some rooms.
20180324_082020
There is another well on the fort.
20180324_082044
After a while, we came to two temples. One is of Lord Khandoba or Malhari on whom this fort is named.
20180324_083317
The views are stunning from here.


छोटीशीच फेरी पुरी करत बालेकिल्ल्यावर चढायचं. गडाचा सर्वात प्रेक्षणीय भाग हा बालेकिल्ला आहे. बालेकिल्लाचे बांधकाम चौकोनी असून तटबंदी बरीचशी शाबूत आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून स्पष्ट दिसणारे दोन मंदिरांचे कळस याचं बालेकिल्ल्यात आहेत.





तलाव




वाड्यांचे अवशेष

वर इतर काही नसलं बालेकिल्ल्यातील वास्तू पडल्या असून आता फक्त अवशेष राहिले आहेत. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. 






20180324_082308
Other temple is of Lord Shiva.
20180324_082342
We saw the Maha Darwaja.

Khandoba temple

आकाराने मोठे मंदिर रेखीव शिवलिंग असलेले सावळेश्वराचे आहे.  दुसऱ्या लहान मंदिरात अश्वारूढ मल्हारीची म्हाळसासोबतची मूर्ती आहे. या मंदिरातील मूर्ती पाहून जेजुरीच्या खंडोबाची आठवण येते. खंडोबाचं प्रशस्त मंदिर आणि महादेवाचं एक छोटंसं देऊळ आहे. खंडोबाच्या सान्निध्यात मुक्काम करता येईल.  मंदिराच्या मागच्या बाजूला काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि एक विहिरही. 
काही अजून पुरातन विहिरी किल्ल्याच्या परिसरात आहेत. हा किल्ला आणि परिसर म्हणजे जणू विहिरींची माळ. खूप विहिरी आहेत या किल्ल्यावर आणि परिसरात पण पाणी एकालाही नाही. 
हा किल्ला अगदी अलीकडे बांधलेला असूनही दुर्गनिर्मितीची प्रकिया लयाला गल्याची चिन्हे ठायीठायी जाणवतात. गोमुखी बांधणीचा दरवाजा, किल्ल्यास उजवीकडे ठेवून जाणारा किल्ल्याच्या सतत मान्यात राहणारा प्रवेशमार्ग, वर्षभर पुरणारा भरपूर पाणीपुरवठा, माठीव दगडांची चिरेबंदी बांधणी, अलंगा - माची - मेट - बालेकिल्ला अशी साग्रसंगीत उभारणी, चिलखती तट व बुरुजबांधणी या शिवनिर्मित दुर्गाच्या खुणा येथे नाहीतच. गावच्या पाथरवटानं बनवलेल्या ओबडधोबड मूर्तीसारखीच याची निर्मिती वाटते.

किल्ल्यावरुन दिवे घाटाजवळची जाधवगढी, पुरंदर - वज्रगडची जोडगोळी, कर्हेच्या पाण्यावर पोसलेली हिरवी झाडी, सासवडचा विस्तार, दक्षिणेकडील पुणे-सोलापूर महामार्गावरचा लोणीकाळभोर अन् थेऊरशेजारचा औद्योगिक परिसर, दिघीची टेकडी अन् लोहगावमधील विमानतळ, कानिफनाथाची टेकडी सारे स्पष्ट दिसू शकते. दक्षिण उतारालगतच धुंदीबाबांनी नटवलेला रामदयाचा परिसरही लक्ष वेधून घेतो. उत्तरेकडची सरदार पानसे यांची सोनोरीचा वाडा पराक्रमाच्या स्मृती जागृत करते.गडावरून आग्नेयेला जेजुरीचं दर्शन होतं तर नैऋत्येला पुरंदरगड दिसतो.
 महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला म्हणून या किल्ल्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मराठ्यांच्या तोफखान्याचा इतिहास प्रतिकृती, छायाचित्रे, नकाशे, ऐतिहासिक वस्तू इत्यादींच्या सहाय्याने उभा करावयास याहून अन्य सुयोग्य जागा नाही. भारतातील सर्व महत्त्वाच्या तोफा व तोफखान्यासंबंधीचे सर्व रणझुंझार सेनानी यांची चित्रे - छायाचित्रे यांचा उत्कृष्ट संग्रह येथे प्रदर्शित करता येईल, डोंगरउतारावर वृक्षारोपण करणे, वाऱ्याच्या सहाय्याने वीजनिर्मिती करणे हे येथे सहज शक्य आहे. महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजनांमार्फत, पुण्यासारखे महानगर शेजारी असताना तेथील अनेक महाविद्यालयातील सेवाभावी युवाशक्तीचा उपयोग केल्यास काही करणे शक्य आहे.
सोनोरी गावापर्यंत किमान बारमाही रस्ता झाला तरी तेथील मुरलीधर ३ विष्णुमूर्ती पाहण्यास रीघ लागेल. येथील पेरू, अंजीर व डाळिंबांचा मोहही पर्यटकांना आकर्षित करु शकतो.

रणझुंजार पिलाजीराव जाधवराव :-

मल्हारगड उर्फ सोनोरीची निर्मिती करणार्या पिलाजीराव जाधवांची आपण सविस्तर माहिती घेउया.
   मराठयांना धुळीत मिळवायचं या एकाच उद्देशाने औरंगजेब बादशाह दक्षिणेत आला होता. संभाजी महाराजांना त्याने पकडलं. त्याला वाटलं मराठे हार मान्य करतील पण तसं घडलं नाही. राजाराम महाराज छत्रपती झाले. त्यांनी सुरवातीला पन्हाळा आणि नंतर जिंजी वरून स्वराज्याचा कारभार पहिला. राजाराम महाराजांच्या नंतर ताराराणी बाईसाहेब यांनी स्वराज्याचा लढा सुरूच ठेवला. संताजी धनाजी सारख्या लढवय्या सेनापतीमुळे मावळ्यांमुळे औरंगजेबाला मराठ्यांवर पूर्ण विजय कधी मिळवताच आला नाही. हीच हाय खाऊन तो मराठी मातीत गाडला गेला.औरंगजेबाच्या मृत्यू नंतर त्याच्या मुलाने आपल्या ताब्यात असलेल्या शंभूपुत्र शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराज हे स्वराज्याचे युवराज होते. त्यांनी आपल्या हक्काच्या छत्रपती पदाच्या गादीची मागणी केली. संकट काळात लढा देऊन स्वराज्याच रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंनी यास नकार दिला. त्यांनी आपल्या मुलाला गादीवर बसवलं होतं.शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि सातारा ही राजधानी घोषित केली. छत्रपतींच्या घराण्यात वाद झाले. स्वराजाची सातारा आणि करवीर अशी दोन शकले झाली होती. मराठा सरदारांनी देखील दोन्हीपैकी एका झेंड्याखाली आश्रय घेतला. शाहू महाराजांची बाजू घेणाऱ्यामध्ये होते खंडेराव दाभाडे, बाळाजी विश्वनाथ भट, हैबतराव निंबाळकर आणि पिलाजीराव जाधवराव.
पिलाजी चांगोजी जाधवराव पुण्याजवळील वाघोली गावचे. तिथली परंपरागत पाटीलकी त्यांच्याकडे चालत आलेली. जिजाऊंचं माहेर लखुजीराव जाधवांशी त्यांचं नातं सांगितलं जातं.शाहूमहाराज मोगलांच्या कैदेतून सुटून साताऱ्यास सन १७०८ मध्ये आले. त्या वेळी परतीच्या वाटेवर सरदार पिलाजीराव जाधव त्यांना सामोरे गेले.  पिलाजीराव जाधवराव यांच्या वडिलांचे नाव चांगोजी तर आईंचे नाव हंसाई होते. चांगोजी जाधवराव यांच्या कडे वाघोली जि. पुणे येथील पाटीलकीचे वतन चालत आले होते. श्रीमंत सुभेदार पिलाजी बिन चांगोजी जाधवराव हे एक अष्टपैलू आणि कर्तबगार व्यक्तिमत्व असणारे रणझुंजार सरदार होते. पिलाजीराव जाधवराव हे बाजीराव पेशवे व चिमाजी आप्पा यांचे युध्द शास्रातील गुरू होते.शाहू महाराजांच्या काळात मराठे उत्तर हिंदुस्थानात खूप सक्रिय होते. तेथे जवळजवळ प्रत्येक वर्षी स्वारी करून मुलुक आणि खंडणी प्राप्त करून घेत असत. पिलाजीराव जाधवराव हे या हालचाली मधील एक अग्रणी सरदार होते. त्यांनी अनेक स्वाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे .शाहूराजांना व येसूबाई राणीसाहेब यांना मोगलांच्या कैदेतून सोडवून आणण्यात पिलाजी जाधवराव यांचा मोठा सहभाग होता.
औरंगजेबाच्या कैदेतून सुटून छत्रपती शाहूमहाराज महाराष्ट्रात आले, तेव्हा पिलाजीराव जाधवरावांनी त्यांना अत्यंत सहाय्य केले. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज व पेशवे या दोघांचाही पिलाजी जाधवराव यांच्यावर अत्यंत लोभ जडला. दक्षिणेतील विस्कळीत झालेल्या मराठा साम्राज्याची घडी बसवण्यात पिलाजीराव जाधवराव यांचा मोठा वाटा होता. इ. स. १७११ मध्ये सेनापती चंद्रसेन जाधव यांच्या कडून बाळाजी विश्वनाथ पराभूत झाले असता पांडवगडाच्या लढाईत पिलाजीराव जाधवराव यांनी बाळाजी व त्यांच्या कुटुंबास सोडवले. सरसेनापती धनाजी जाधवांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे म्हणजेच चंद्रसेन जाधवांकडे सेनापती पद आले होते. पण  त्याचे आणि बाळाजी विश्वनाथ या दोघांच्यात काही कारणामुळे वितुष्ट आले.बाळाजी विश्वनाथ भट हे एकेकाळचे धनाजी जाधवांच्या सैन्यातील कारकून आता शाहूमहाराजांच्या विश्वासातील सरदार बनले होते. त्यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती केली होती. त्याच्याकडे पुण्याची सुभेदारी होती. पण सेनापती चंद्रसेन जाधवांसोबत त्यांचे वाद वाढले. सेनापतींनी त्यांंच्यावर हल्ला केला. घाबरलेले बाळाजी विश्वनाथ भट पळाले व आपल्या बायका पोरांसहित पांडवगडावर आश्रय घेतला.चंद्रसेन जाधवांनी पांडव गडावर वेढा टाकला. छत्रपती शाहू महाराजांनी चंद्रसेन जाधवांचं पारिपत्य करण्यासाठी हैबतराव निंबाळकर आणि पिलाजीराव जाधवराव यांना पाठवले. पांडवगडच्या लढाईत पिलाजीरावांनी बाळाजी विश्वनाथ आणि कुटुंबाची सुटका करवली.बाळाजी विश्वनाथांंचा मुलगा पहिला बाजीराव तेव्हा अवघ्या बारा वर्षाचा होता. पिलाजीराव जाधवांचा पराक्रम आणि त्यांची मुत्सद्देगिरी अगदी जवळून पाहिल्यामुळे त्याच्या मनात पिलाजीरावाबद्दल शेवट पर्यंत आदर व प्रेम कायम राहिलं. पुढे पेशवे व निजाम यांचे बिनसले असता औरंगाबाद प्रांत कब्जात आणण्याचा खुद्द बाजीराव पेशव्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी ही जोखीम पिलाजीराव जाधवराव यांनी स्वतःहून अंगावर घेतली व घोड्याला उलटी नाल मारून दोन महिने घोड्याची खोगीर न उतरता पिलाजीराव जाधवराव यांनी औरंगाबादवर वसुल बसवला. याबद्दल सुमारे दीड लक्ष रुपयांचा मुलुख बाजीराव यांनी पिलाजी जाधवरावांना शाहू महाराजांकडून घेऊन दिला. मोगला विरुद्ध निजाम आणि मराठे यांनी संयुक्तपणे केलेल्या युद्धामध्ये व दाखवलेल्या पराक्रमामुळे पिलाजी जाधवराव यांना जलादत्त इन्कलाब म्हणजे रणशूर किंवा शौर्य क्रमाचे मर्मज्ञ अशा उपाधीने गौरवले. जंजिरा सिद्धी, बाणकोट, गोवळकोंडा, या मोहिमेवर पिलाजीराव जाधवराव अग्रस्थानी होते. 
पुढे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथाकडे पेशवाईची वस्त्रे दिली. पेशवा बाळाजी विश्वनाथांंनी करवीर गादीचा प्रांत साताऱ्याला जोडण्याचा प्रयत्न चालवला. यातूनच करवीर संस्थानचे सरदार दामाजी थोरात यांनी त्यांना पकडले व हिंगणगाव च्या गढीत कैदेत टाकले. पिलाजीरावांनी त्या थोरातास पकडून शाहूराजांपुढे आणले .(इ.स. १७१७ ) या कामगिरीवर खुश होऊन छत्रपती शाहूमहाराजांनी पिलाजीराव जाधवरावांना  पुणे प्रांतातील मौजे दिवे व मौजे नांदेड ही गावे इनाम दिली. आजची भव्य अशी नांदेड सिटी असणारा हा भाग. पेशव्यांचा देखील पिलाजीरावावर विश्वास होता. त्यांची दोन्ही मुले बाजीराव व चिमाजी अप्पा ही पिलाजीरावांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध शास्त्र शिकले.
इ. स. १७२९ मध्ये बाजीराव पेशवे छत्रसालाच्या मदतीला गेले त्यावेळी पिलाजीराव जाधवराव त्यांच्याबरोबर होते. या युद्धात त्यांनी शत्रूचा पराभव केला. या युद्धातील पराक्रमामुळे छत्रसाल राजाने पिलाजीराव जाधवरावांना सागर प्रांतातील मोठी जहागिरी दिली. गढामंडलाच्या मोहिमेत छत्रसालाच्या मुलाने बाजीरावाबरोबर पिलाजीरावांचाही सत्कार केला होता. 
सन. १७३० मध्ये वसईची मोहीम झाली, त्या मोहिमेत पिलाजी जाधवराव अग्रस्थानी होते. या मोहिमेचे नेतृत्व पिलाजीराव जाधवराव यांनी केले होते. या मोहिमेत वसईवर विजय मिळवूनच पिलाजीराव जाधवराव मागे फिरले. माळवा, बुंदेलखंड, उत्तर हिंदुस्थान, सुरत, भेलसा, प्रयाग, बंगाल, नेवासे इथपर्यंत त्यांनी मजल मारून. इ. स. १७४२ मध्ये बंगाल प्रांताची चौथाई शाहू महाराजांना मिळवून दिली.पिलाजीराव बंगालच्या स्वारीतही सहभागी होते. त्यांनी व्यंकटराव घोरपडे व कोल्हापूरकर छत्रपती संभाजी यांचा तंटा मिटवला. कान्होजी आंग्रे यांना इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या विरोधात मदत केली.
इ.स. १७३७ मध्ये चिमाजी आप्पाने पोर्तुगीजां विरुद्ध काढलेल्या वसईच्या मोहिमेमध्ये  होळकर शिंदे शितोळे या मराठेशाहितल्या नामांकित सरदारांसह पिलाजीराव जाधवराव अग्रस्थानी होते.या मोहिमेत पाच प्रमुख मोर्चातील हुजुरातीच्या मोर्चाचे नेतृत्व त्यांनी केलं.
पोर्तुगीजाना हरवण्यात चिमाजी अप्पा सोबतच या सर्व सरदारांची तलवार देखील कारणीभूत ठरली. बाजीरावांंचे पुत्र नानासाहेब पेशवे देखील पिलाजीरावाचा पराक्रम जाणून होते व युद्धप्रसंगी त्यांची मसलतबजरूर घ्यायचे. पिलाजीराव जाधवांनी शाहू छत्रपती व पेशव्यांच्या तीन पिढ्याच्या कारकिर्दीत सतत पन्नास वर्षे उत्तर व मध्य भारत, बंगाल, कोकण, कर्नाटक या भागात आपली घोडी दौडवली व त्यांच्यावर वचक ठेवला. अनेक लढाया मारल्या.उत्तरेत अनेक जहागिरी मिळूनही त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य करून छत्रपतींच्या सैन्याच नेतृत्व केलं. शेवट पर्यंत त्यांची छत्रपती शाहू महाराजांवरील राजनिष्ठा कधी ढळली नाही.त्यांनी दिलेला प्रत्येक आदेश प्रमाण मानला. सासवड जवळील दिवे घाट येथे जाधववाडीमध्ये त्यांनी बांधलेली गढी आजही मराठा वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना म्हणून दाखवली जाते. त्यांनी वाघोली येथे वाघेश्वराच मंदिर उभारलं. त्याच्याजवळच त्यांची समाधी देखील आहे. 
 शाहू छत्रपती व पेशव्यांच्या तीन पिढ्यांच्या कारकिर्दीत पिलाजीराव जाधवराव यांनी सतत पन्नास वर्ष उत्तर व मध्य हिंदुस्थान, बंगाल, कोकण, कर्नाटक आणि फिरंगण्यातील अनेक युद्ध मोहिमेत मराठ्यांचे नेतृत्व केले. युद्धप्रसंगी शाहू महाराज नेहमीच पिलाजीराव जाधवरावांच्या बरोबर सल्लामसलत करत असत. मध्य हिंदुस्थानात अनेक जहागिऱ्या मिळूनही त्यांनी महाराष्ट्रात वास्तव्य करून हुजारातीच्या सैन्याचे शेवटपर्यंत नेतृत्व केले. प्रखर राज्य निष्ठा, स्वराज्य प्रेम, असामान्य शौर्य, अध्यात्म वृत्ती, मुत्सद्देगिरी हे गुण पिलाजीराव यांच्यामध्ये पुरेपूर भरले होते. चाकण परगण्यातील गोलेगाव व मरगळ ही दोन गावे इनाम छत्रपती शाहूंमहाराजांनी जाधवरावांना इनाम म्हणून दिली. पेशवे जरी शुरपणे नेतृत्व करत होते तरी, ह्या पराक्रमी कार्याचे व शौर्याचे मर्म जाणणारा सूत्रधार म्हणजेच पिलाजीराव जाधवराव हेच होत. छत्रपती शाहूमहाराज यांच्या काळात मराठी राज्याचा जो विस्तार झाला त्या यशाचे फार मोठे वाटेकरी म्हणून पिलाजीराव जाधवरावांचे नाव घ्यावे लागेल. पिलाजीरावांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसवल्या. त्यासंबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात : ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी नाम संवत्सरे शाहू छत्रपती महाराज यांनी पिलाजी बिन (वडिल) चांगोजी यास मौजे दिवे येथे पेठ वसवण्यास सोयीचे गाव आहे, तरी पेठ वसवावी. तिचे नाव शाहूपुरी असे ठेवावे. त्यास तुम्हास पेठेचे सेटेपण इनाम वंशपरंपरेने इतर ठिकाणचे वाणी उदमी आणावे, वतन वंशपरंपरेने खावे.’दिवेघाटातील मस्तानी तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव पिलाजीराव यांनी बांधला. पिलाजींची ब्रह्मेंद्रस्वामींवर नितांत श्रद्धा होती. पेशव्यांच्या दरबारात पिलाजीरावांना इतर सरदारांपेक्षा विशेष मान होता. त्यांचा एकंदर फौजफाटा व जातसरंजाम मिळून अडीच लक्षांचा मुलूख होता. 
पिलाजी जाधवराव यांची कामगिरी मागे टाकून मराठे शाहीच्या इतिहासाची पाने ऊलटू शकणार नाहीत. ३ जुलै १७५१ मध्ये पिलाजी जाधवराव काळाच्या पडद्याआड गेले. त्यांची समाधी पुणे जिल्ह्यात वाघोली येथे आहे. या घराण्यातील सध्याचे वंशज संग्रामसिंहराव हे प्रेमळ व सुस्वभावी आहेत. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या जहागिरीच्या ठिकाणी म्हणजेच नांदेड येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक नांदेड सिटी येथे समुहशिल्प उभारण्यात आले आहे. 

सोनोरी पानसे वाडा :-

मल्हारगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी गावात पानसे यांचा वाडा आहे.


पानसे (गढी) वाडा




20180324_095825

20180324_100241
 सोनोरी गावात शिरताच दोन भरभक्कम बुरुजात बांधलेलं प्रवेशद्वार नजरेस पडत व त्याला लागून असलेली तटबंदी. वाडयात गजाननाचे व लक्ष्मीनारायणाचे सुंदर मंदिर आहे.

 20180324_100231


मंदिराचा दरवाजा कुलूप लावून बंद केलेला असतो. या मंदिरातल्या  मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७४ रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मुर्ती गाभार्‍यातील कोनाड्यात ठेवलेली आहे. मंदिराच्या समोर पाण्याच सुकलेल टाक आहे. तर मागच्या बाजूला पायर्‍या असलेली मोठी विहिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस ३ छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचा गणपती, सूर्य, यांच्या मुर्ती व शिवलिंग आहेत.

बारव 

या मुख्य मंदिराभोवती गणपती, महादेव, देवी व सूर्यमंदिर उभारून हे विष्णुपंचायतन पूर्ण केले आहे.
सोनोरीतील सर्वांत देखणी मूर्ती म्हणजे श्री मुरलीधराची. नीळकंठ विठ्ठल पानसे यांनी हे मंदिर उभारले. बारामतीजवळील पणदरे गावच्या खाणीतील काळ्या घोटीव दगडातून हे मंदिर बांधले आहे. आतील मूर्ती अतिशय देखणी आहे. कुंजवनात उभ्या राहिलेल्या या कृष्णाची मूर्ती दिडक्या पायावर आहे इ तो मुरली वाजवीत आहे. कळपातील गाई मोहित होऊन अत्यानंदाने शेपूट उभारून धावत येत आहेत. एक गाय श्रीकृष्णाचे पाय चाटीत आहे. तर दुसरी एकाग्र चित्ताने निश्चल नजरेने श्रीकृष्णाकडे टक लावून पाहत आहे. एक मीटर उंचीचे काळे कुळकुळीत असे हे शिल्प अगदी दृष्ट लागण्यासारखे आहे. प्रभावळदेखील अखंड पाषाणात व सुंदर नक्षीची आहे. या सोनपुरीत विठोबा, राम, बहिरोबा, सोनेश्वर महादेव, मारुती, देवी अशी आणखीही मंदिरे आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूला तटाला लागून लहानसं गणपती मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूची पडकी विहीर आहे. पायऱ्या असलेली ही विहीर बऱ्यापैकी मोठी आहे. या विहिरीला लागूनच पानसे यांचा वाडा आहे. 



 सभामंडपातून गाभाऱ्याकडे जाताना देवडीत रथावर आरूढ असणाऱ्या देवतेचं शिल्प पहायला मिळतं. 

सूर्यदेव 


हि देवता म्हणजे सूर्यदेव. वेदांमध्ये सूर्यला आत्मा म्हंटले आहे तर यजुर्वेदामध्ये चक्षो सूर्यो जायत म्हणजे भगवंताचे डोळे. वेदकाळात प्रथम मंत्रा द्वारे सूर्याची पूजा केली जात असे यानंतर मूर्ती व त्यानंतर सूर्याची मंदिरे बांधली गेली. पुराणात सूर्य हा ऋषी कश्यप व आदितीचा पुत्र म्हणून उल्लेख आहे. सूर्याला छाया व सज्ञा या दोन पत्नी आहेत. शनी,यम, अश्विन कुमार व यमुना नदी व महाभारत मधील कर्ण हे सूर्याचे पुत्र पुत्री आहेत. सूर्याच्या मूर्तीचे दोन प्रकार पहायला मिळतात एक रथावर आरूढ असलेली सूर्यदेवाची मूर्ती तर दुसरा दोन्ही हातात कमळ घेतलेली मूर्ती. या मंदिरात रथावर आरूढ असलेली मूर्ती आहे. ज्यात रथाला सात घोडे व सारथी अरुण तर एक हात मुद्रेत व दुसऱ्या हातात कमंडलू असलेले ध्यानस्थ सूर्यदेव आहेत.

बुरुज व त्याला लागून असलेली तटबंदी 

लाकडी प्रवेशद्वार आणि तटबंदीने हा वाडा सुरक्षित ठेवण्यात आला होता. हा वाडा ३ मजली होता, आता त्याची पडझड झाली असुन एकाच मजली उरला आहे. वाड्यातील शिसवी कमानी आणि देवघर आम्हाला त्या काळात घेऊन जाते. 

पानसे वाडा 


मंदिर पाहून मंदिराच्या मागे असलेल्या प्रवेशद्वाराने आत गेल्यास तिथं काही खोल्या दिसतात, आतमध्ये एक आजी इथंच वास्तव्याला आहेत त्यांची परवानगी घेउन आतमध्ये जायचे. आत बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे. दगडी तळखडे व त्यावर लाकडी खांब लावून छत उभारलं आहे. तिथेच कारंजा सुद्धा आहे. उजव्या हाताला तीन खोल्या आहेत. त्यांना कुलुपं आहेत तर डाव्या हाताला एक खोली आहे तिथं या आज्जी रहातात. ह्या वाड्यात या आज्जी एकट्या राहतात तर बाकीचे कुटुंबीय सगळे पुण्यात रहायला होते.



   आपल्या पूर्वजांचा वारसा सांभाळत या अज्जी इथच रहातात तरी पण ह्या पडक्या वाड्यात एकटं राहणं थोडं हॉररच वाटते. सहा बुरुजांची तटबंदी असलेला हा वाडा झाडी झुडपांनी वेढलेला आहे, काही ठिकाणची तटबंदी ढासळलेली आहे. वाड्याकडे सहसा कोणी फिरकत नाही त्यामुळं हा वाडा दुर्लक्षित आहे. वाड्यापासून थोडं पुढं एक बारव आहे. जुन्या काळात बांधलेली दगडी बारव आहे. पाणी उपसणायसाठी इथे अगोदर मोट होती त्याचे अवशेष पहायला मिळतात. गावकरी पिण्यासाठी इथल्याच पाण्याचा पाण्याचा वापर करतात. 
 सरदार पानसे यांचे पूजेतील देवघर अजून सुस्थितीत आहे. सरदार पानसे यांचे वंशज यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच गावकर्‍यांनी सुद्धा अनमोल इतिहास जतन करणे आवश्यक आहे.

सरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे व समाधी, वाघोली :-

पुणे–अहमदनगर मार्गावर, पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर, वाघोली या गावात पेशव्यांच्या काळातील सरदार पिलाजीराव जाधव यांचे ते वाडे त्यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि वैभवाची स्मृती जपून आहेत.
   वाघोली गावात प्रवेश केल्यावर, गावाच्या मध्यभागी, सुस्थितीत असलेली वेस पाहण्यास मिळते. पूर्वी ती गावाच्या सीमारेषेवर होती. मात्र गावाचा विस्तार वाढत गेल्यानंतर ती आता गावाच्या मध्यभागी आली आहे. पंचवीस फूट उंचीच्या त्या वेशीचे चिरेबंदी बांधकाम गेली अडीचशे वर्षें ऊन, पाऊस, वादळ-वारा, थंडी यांना झेलत ताठ उभे आहे. वेशीची सुबक कमान पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.
 वेशीतून आत प्रवेश केला, की थोड्याच अंतरावर सरदार पिलाजीराव जाधव यांचा वाडा आहे. वाड्याची तीस-पस्तीस फूट उंचीची तटबंदी पाहून वाड्याच्या भव्यतेची सहज कल्पना येते. तटबंदीजवळून पुढे सरकल्यावर उजव्या हाताला वाड्याचा प्रचंड दरवाजा नजरेत भरतो. त्यावरील कमळांची शिल्पे चित्त वेधून घेतात. दरवाजावरील वीटकामातील सज्जा मात्र पूर्णपणे ढासळला आहे. त्यासाठी वापरलेले लाकूडही जराजर्जर झाल्याचे दिसते. तरीसुद्धा तो सागवानी दरवाजा जाधवांच्या महानतेची जाणीव पाहणाऱ्याला करून देतो.
   दरवाजातून प्रवेश केल्यावर झाडा-झुडुपांच्या आत दडलेली तेथील इमारतींची चिरेबंदी जोती आणि त्यांचे टोलेजंग स्वरूप दृष्टीपुढे उभे राहते. त्या वाड्यात पूर्वी आग लागून बऱ्याच गोष्टी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे तेथे इमारतींच्या जोत्यांशिवाय व आतील चौकांशिवाय काही नाही. जाधवरावांच्या सध्याच्या वारसदारांपैकी संग्रामसिंहराव यांच्याकडून आतील मूळ वाडा सहा मजल्यांचा होता असे समजले.
वाड्याच्या बाहेर पडून सात-आठ पायऱ्या उतरल्या, की वाड्यासमोरचा रस्ता लागतो. तेथून दुसऱ्या वाड्याकडे जाणारी वाट आहे.

        जाधवरावांच्या दुसऱ्या वाड्याचीही तटबंदी तिचा भक्कमपणा टिकवून आहे. मुख्य दरवाजा दुरुस्त केल्यामुळे चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची कमान सुस्थितीत असून तिच्यावरील सज्जांचे बांधकाम नवीन केले आहे. त्यामुळे तेथे जुन्या-नव्याचा संगम पाहण्यास मिळतो.

दरवाजातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंच्या ढेलजा (रखवालदाराच्या चौक्या) रेखीव सागवानी खांब आणि तुळया यांवर भक्कमपणे उभ्या असलेल्या दिसतात. वाड्याचे जोते चिरेबंदी आहे. त्या चौसोपी वाड्याच्या दोन सोप्यांच्या जोत्यांवर नवीन बांधकाम करण्यात आले आहे. तेथे सरदार पिलाजीराव जाधव यांचे वंशज रामचंद्रराव वास्तव्य करत आहेत.
   वाड्याच्या जवळपास जाधवरावांनी राममंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, भैरवनाथ अशी अनेक मंदिरे बांधली. ती सारी गावाची श्रद्धास्थाने झाली आहेत. आजही त्या मंदिरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांनी गावात नवे चैतन्य निर्माण होते.

  गावातून बाहेर पडल्यावर पुणे-अहमदनगर मार्गाच्या पलीकडे सरदार पिलाजीराव जाधव यांची भव्य छत्री (समाधी) आहे. त्या भव्य चौथऱ्यावर घोटीव पाषाणातील सुबक बांधकाम आहे. समाधीजवळच जाधवराव घराण्यातील इतर पुरुषांच्या समाधी दिसतात.

वाघोलीचा वाघेश्वर  :-

Mastani Lake, Dive ghat
Mastani Lake, Dive ghat
पिलाजीरावांच्या समाधीपासून आठ-दहा मीटर अंतरावर सरदार पिलाजीरावांनीच बांधलेले वाघेश्वराचे भव्य मंदिर आहे. पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून 20 कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे  मध्ययुगीन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर पेशवाईकालीन स्थापत्य शैलीतील आहे. 
   मंदिराचे बांधकाम उत्तम प्रकारच्या कातीव (घडीव) दगडांचे असून ते सुस्थित आहे. मंदिरावर कोरलेली शिल्पे नेत्रसुखद आहेत. 

          वाघेश्वर मंदिराची रचना ही चौकोनी गाभारा, सभा मंडप, भिंतीवरील अनेक कोनाडे, शिखराची रचना टप्प्याटप्प्याची खालच्या टप्प्यापेक्षा वरचा टप्पा लहान होत जाणारा. त्यामुळे मंदिराकडे पाहिल्यास आपली नजर सरळ  वर न जाता ती आडव्या रेषामध्ये जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. 

मंदिरासमोरील नंदी त्या वास्तूच्या भव्यतेत भर घालतो.  नंदी पांढ:या रंगात रंगवलेला आहे.
मंदिराच्या बाहेरील प्रत्येक स्तंभाची रचना कलशावर कलश मांडून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. 
मंदिराच्या बाहेरील खांबावर दगडी शिल्पामध्ये राम अवतार, बळीवामन, शेषशाही विष्णू, नृसिंह अवतार, वराहअवतार, गरुड देवता, हनुमान, मत्स्य अवतार, कच्छ अवतार,यक्ष, व्याल, महिशाशूरमदिर्नी, मल्ल, व्याल,कल्की अवतार, गणोशमूर्ती, नागदेवता, सहस्त्न भाऊ आणि परशुराम युद्ध ,अश्वमेध यज्ञ, घोडा अशा शिल्पकृती दगडावर कोरलेल्या आहेत.

मंदिरातील शिवलिंग आळंदीजवळील चऱ्होली गावातून आणण्यात आले होते. बाजीराव पेशव्यांनी तेथील तळ्याजवळील बागेसाठी जमीन दिली होती. ते स्थळ सरदार पिलाजीराव जाधव यांची भव्य छत्री, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या समाधी, शेजारील विस्तीर्ण तलाव, भव्य आणि सुंदर असे वाघेश्वर मंदिर या गोष्टींमुळे विलोभनीय झाले आहे. तेथील तळ्यात नौकानयनाची सुविधा केल्यामुळे ते स्थळ पुणेकरांच्या सहलीचे ठिकाण बनले आहे.
संदर्भ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटीयर
२) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के. घाणेकर
३) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
४) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
५) महाराष्ट्र देशातील किल्ले- चिंतामण गोगटे
६) www.trekshitiz.com हि वेबसाईट
७)  www.durgbharari.in   हि वेबसाईट
८) महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे ( डॉ. सदाशिव शिवदे )
९) https://thinkmaharashtra.com/
१०) http://anandgodse.blogspot.com/2014/04/blog-post.html
११) Discover Maharashtra ( धर्मराज खेडेकर )
१२)  डॉ. सदाशिव शिवदे, डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर, परशुराम जगताप देशमुख. सासवड

फोटो :
- सरदार पिलाजी जाधवराव यांची पेंटिंग - पेशवा संग्रहालय, पर्वती ( जि. पुणे )










 





 












गडाची माची साधारण त्रिकोणाकृती आहे आणि त्यावर असलेला बालेकिल्ला चौकोनी आहे. माचीची आणि गडाची तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असल्यामुळे गडाचं गडपण नजरेत भरतं. प्रवेशद्वारातून बालेकिल्ल्यावर जाताना वाटेत सदरेचे अवशेष दिसतात. पुढे एक विहीरही दिसते. बालेकिल्ला उजवीकडे ठेवत तटाच्या बाजूनं फेरी सुरू करायची. पुढे एक पाण्याचं टाकं आणि विहीर लागते. छोटीशीच फेरी पुरी करत बालेकिल्ल्यावर चढायचं. वर इतर काही नसलं तरी खंडोबाचं प्रशस्त मंदिर आणि महादेवाचं एक छोटंसं देऊळ आहे. खंडोबाच्या सान्निध्यात मुक्काम करता येईल.
गडावरून आग्नेयेला जेजुरीचं दर्शन होतं तर नैऋत्येला पुरंदरगड दिसतो. हा मल्हार गड १७६० मधे माधवराव पेशव्यांनी बांधला अशी माहिती मिळते. पाऊण तासात गडफेरी करून माघारी वळायचं.  .

 




मल्हारगड प्रशस्त आणि मोकळा ढाकळा आहे. समोरच असलेलं  पाण्याचे टाकं  पाहून आम्ही मोकळ्या असणाऱ्या पठारातून बालेकिल्ल्यात प्रवेश केला.
गडाचा सर्वात प्रेक्षणीय भाग हा बालेकिल्ला आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे.  बालेकिल्ल्यातील वास्तू पडल्या असून आता फक्त अवशेष राहिले आहेत. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. आकाराने मोठे मंदिर रेखीव शिवलिंग असलेले सावळेश्वराचे आहे.  कुठेही गडावर गेलो कि तेथील मंदिरात दिवाबत्ती करायची हा माझा शिरस्ता मी इथेही पार पडला. दुसऱ्या लहान मंदिरात अश्वारूढ मल्हारीची म्हाळसासोबतची मूर्ती आहे. या मंदिरातील मूर्ती पाहून मला जेजुरीच्या खंडोबाची आठवण झाली. यावरूनच किल्ल्याचे नाव मल्हारगड पडले. त्याचा इतिहास असा कि,
किल्ला बांधत असताना एका ठिकाणी कुदळीचा  घाव घातल्यावर रक्त वाहू लागले. सरदार पानसेंनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचा संकल्प केला. म्हणून या किल्ल्याला त्यांनी मल्हारगड नाव दिल्याची दंतकथा प्रचलित आहे. इंग्रजांच्या विरुद्ध बंडात उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके यांनी या गडाचा आश्रय घेतला होता असे म्हणतात. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे. ते पाहण्यासारखे आहे. थोडा वेळ थांबून २-४ मिनटे फोटोसेशन करून किल्ल्याच्या तटबंदीने पूर्ण किल्ला पाहून आम्ही पाहून घेतला.  किल्याला असणारी हि तटबंदी साधारण ११०० मीटर लांबी असलेली दुहेरी तटबंदी आहे.  एव्हाना सूर्यास्त होत आलेला. संपूर्ण गडावरून सूर्यास्ताचे अनोखा नजर दिसत होता. पश्चिमेला बुरुजाच्या पलीकडून सूर्यनारायण हळूहळू मावळतीला जात होते. मराठेशाहीच्या या शेवटच्या बांधलेल्या  किल्ल्यावरून दिसणारे हे दृश्य म्हणजे जणू काही मराठेशाहीच्या सूर्यास्ताचीच साक्ष देत होते.

काळेवाडीतून मल्हारगडाच्या पायथ्याशी जाणाऱ्या त्या निर्मनुष्य वाटेवर दोन वेळा ससा आमच्या बाईकच्या पुढे पळत होता. पण अथक प्रयत्यानंतरही या सशाने आमचे कासव केले आणि नाहीसा झाला. पुढे जाऊन या रस्त्याचं काम चालू होतं म्हणून खडींचे डोंगर रचून ठेवले होते. आजूबाजूला फक्त लख्ख काळोख दिसत होता. गुगल मॅप वर मल्हारगड टाकलं आणि त्याने झेंडेवाडीतून/कळेवाडीतून जाणाऱ्या; आजून काम चालू असलेल्या या रस्तावर आणून उभं केलं. काळेवाडीतून डावीकडे रात्री ३ च्या दरम्यान टर्न घेतला होता तेव्हा, आपल्या केस-दाढीहून पांढऱ्या धोतर-बंडी-टोपीतील आजोबा पिंपळाला प्रदक्षिणा घालत होते. ते आजोबा आणि तो पिंपळ या दोन जीर्ण गोष्टी सोडल्या तर बाकी सारा गाव झोपला होता. याच आजोबांना रस्ता विचारावा म्हणून ३.३० ला परत तिथेच आलो तर तिथे फक्त पिंपळ होता आजोबा नव्हते. एवढ्या रात्री कोणाचं दार वाजवायचा म्हणून मग गावापासून काही अंतरावर असलेल्या शाळेत अंथरूण घालण्याचा निर्णय घेतला. या अश्या आडगावातल्या शाळा आणि मंदिरंचं आमच्यासारख्या भटक्यांना विसावा देतात. त्या शाळेच्या व्हरांड्यात भिंतीवर लिहलेले सुविचार वाचत, माझ्या शाळेच्या आठवणीत मी विसावलो. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली तेव्हा ६.३० वाजले होते. आवरलं फटाफट आणि जाग्या झालेल्या गावातील एकाला 'सोनोरी' गावाचा रस्ता विचारला.




सोनोरी; मल्हारगडाच्या पायथ्याचं गावं! याचं गावाच्या नावावरून या किल्ल्याला सोनेरीचा किल्ला पण म्हणतात.  महाराष्ट्रातील सगळ्यात शेवटी बांधल्या गेलेला किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो. पेशव्यांचे तोफखान्याचे सरदार 'कृष्णराव पानसे' यांनी हा किल्ला १७५७ - १७६० या काळात हा किल्ला बांधला. पुण्याहून सासवडला जातांना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. सन १७७१ - ७२ मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. या किल्ल्याचा उपयोग दिवेघाटावर आणि आजुबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. इंग्रजां विरुध्दच्या बंडात उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके यांनी या किल्ल्याचा आश्रय घेतला होता. सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे पुण्याच्या दक्षिणीकडील वेल्हे तालुक्यात पसरले आहेत. पैकी एका डोंगररांगेवर राजगड-तोरणा उभे आहेत. दुसरी रांग म्हणजे पूर्व-पश्चिम पसरलेली भुलेश्वर रांग. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत.

सोनोरी गावात पोहोचताच, दोन दगडी बुरुजांमध्ये एक प्रवेशद्वार दिसले. हीच ती पानसे सरदारांची गढी. किल्ला बघून मग ती पहावी म्हणून आम्ही किल्ल्यावर जाणारी वाट पकडली. पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वार अगोदर एक लहानसं नेढे आम्हाला दिसले. समोरच किल्ल्याचा बुरुज दिमाखात उभा होता. मुख्य प्रवेशद्वार दोन बुरुजांनी वेढलेलं होत. लागूनच आत, पहारेकर्यांच्या देवड्या होत्या. आत बालेकिल्ल्याच्या तटबंदी अगोदर एका वाड्याचे अवशेष दिसले. जवळच एक विहीर लागली. किल्ल्याच्या तटाला लागून आम्ही गडफेरी सूरु केली. थोड्या अंतरावर बालेकिल्ल्याच्या मागच्या बाजूला एक कोरीव तळे आहे. तळ्यात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. बालेकिल्ल्यातून तलावावर जाण्यासाठी तटबंदीत एक दिंडी दरवाजा बांधलेला आहे. तलावाच्या पुढे किल्ल्याच्या टोकाला एक बुरुज दिसला. याच बुरुजावरून समोर आम्हाला काळेवाडी/झेंडेवाडीतून येणार रस्ता दिसला आणि अंदाज आला की आम्ही किल्ल्याच्या किती जवळ आलो होतो काल रात्री. या बुरुजाकडून उजवी कडे पुढे गेल्यावर एक चोर दरवाजा दिसला. याच दरवाज्याने आम्ही काल प्रवेश केला असता. बुरुजाच्या जवळच आजून एक विहीर दिसली. पुढे चालत गेल्यावर किल्ल्याच्या माचीवर नेणारा एक दरवाजा आणि तटबंदीला लागूनच असलेला बुरुज दिसला. या बुरुजाच्या डाव्या बाजूने पुढे, बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. बालेकिल्लाचे बांधकाम चौकोनी असून तटबंदी बरीचशी शाबूत आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून स्पष्ट दिसणारे दोन मंदिरांचे कळस याचं बालेकिल्ल्यात आहेत. ही दोन मंदिरे बालेकिल्ल्यात बाजूबाजूलाच असून यातील लहानसे देऊळ खंडोबाचे, तर दुसरे थोडे मोठे देऊळ महादेवाचे आहे. खंडोबाच्या देवळामुळेच या गडाला मल्हारगड हे नाव पडले असावे. महादेवाच्या देवळात शंकराची पिंडी आहे. कोणीतरी आमच्या अगोदर या मंदिरातील दिवा लावून गेले होते आणि देवापुढे प्रत्येकी अर्धा चिकू वाहिला होता. मंदिराच्या मागच्या बाजूला काही वाड्यांचे अवशेष आहेत आणि एक विहिरही. किल्ला पाहून पुन्हा मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही खाली उतरलो. काही आजून पुरातन विहिरी आम्ही किल्ल्याच्या परिसरात पहिल्या होत्या. किल्ला उतरून आम्ही त्या पण पाहून घेतल्या, पैकी एका विहिरीवर दगडी आड बांधला होता. हा किल्ला आणि परिसर म्हणजे जणू विहिरींची माळ. खूप विहिरी आहेत या किल्ल्यावर आणि परिसरात पण पाणी एकालाही नाही. किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतकाऱ्याबरोबर बोललो आणि वाटेत पाहिलेल्या अनेक सुकलेल्या सिताफळबागा आणि आटलेल्या विहिरी याचं कारण कळलं..दोन वर्ष या भागात पाऊस नव्हता!
सोनोरी गावात येऊन आम्ही पेशवे सरदार पानसे यांची गढी पाहण्यास सुरवात केली. दोन बुरुजांमध्ये उभ्या असलेल्या प्रवेशद्वाराने आत जाऊन आम्ही लक्ष्मी-नारायण मंदिर पाहायला सुरवात केली. मंदिराचा दरवाजा कुलूप लावून बंद केलेला होता. या मंदिरातल्या मूर्तीबद्दल खूप वाचलं होतं. या मुर्तीत गरूडाच्या खांद्यावर बसलेला विष्णू व त्याच्या डाव्या बाजूला लक्ष्मी दाखवलेली आहे. हि मुर्ती ७ मार्च १७७४ रोजी कर्नाटक स्वारीच्या वेळी मेळेकोट येथे केलेल्या लुटीत मिळाली होती. याशिवाय दगडात कोरलेली गरुडाची मुर्ती गाभार्‍यातील कोनाड्यात ठेवलेली आहे. पण हे सगळं पाहणं आमच्या नशिबात नव्हतं आज. मंदिराच्या समोर पाण्याच सुकलेल टाक आहे. तर मागच्या बाजूला पायर्‍या असलेली मोठी विहिर आहे. मंदिराच्या उजव्या व डाव्या बाजूस ३ छोट्या देवळ्या आहेत. त्यात उजव्या सोंडेचा गणपती, सूर्य, यांच्या मुर्ती व शिवलिंग आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूला तटाला लागून लहानसं गणपती मंदिर आहे. ते पाहून आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूची पडकी विहीर पाहायला आम्ही गेलो. पायऱ्या असलेली ही विहीर बऱ्यापैकी मोठी आहे. या विहिरीला लागूनच पानसे यांचा वाडा आहे. लाकडी प्रवेशद्वार आणि तटबंदीने हा वाडा सुरक्षित ठेवण्यात आला होता. हा वाडा ३ मजली होता, आता त्याची पडझड झाली असुन एकाच मजली उरला आहे. वाड्यातील शिसवी कमानी आणि देवघर आम्हाला त्या काळात घेऊन गेलं. देवघरात फक्त एक ताक ठेवलेलं होतं. या पडक्या वाड्यात एक आजी आम्हाला भेटल्या; पानसे वावंशजांचे नातेवाईक असल्याचं आणि देखभाल करण्यासाठी इथे राहत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या पडक्या वाड्यात एक पडत आलेला देह पाहून आम्ही निघालो.





Endurance level: Easy
Things to carry: Sports Shoes, 2 liters of water, some snacks
How to Reach: Follow Google maps
Malhargad is believed to be the last fort built by Marathas. It was constructed by Army commander Panse who was in the service of Peshwa. The area on the fort is small. It must have been used as a watchtower to keep an eye on Dive ghat and surrounding region.
There are three routes to enter in the fort.
1. From the base village Sonori, one can cross a small hill and reach via Maha Darwaja (Main gate).
2. Another route is via Zendewadi village which is also via a hill.
3. The third one is from Kalewadi village which takes to Chor Darwaja (Secret gate). This is the route shown in Google Maps. We went up by this path.
Since many of my friends were busy, I asked my wife if she is interested and she nodded positively. We decided to start early in the morning to avoid the heat. We left at 5-30 AM on my bike and took the route within Pune city as suggested by the Maps. It was still dark and very cold in the morning. It is a pleasant experience riding in Dive ghat when sunrise happens and sun-rays falling on the surrounding hills.
20180324_065351
We took first stop in the Dive ghat. In rainy season, it must be looking even more beautiful with water streams flowing down the hills and greenery all around. We spotted Mastani lake and clicked few snaps.
20180324_065341
The road till Kalewadi village is good but it deteriorates further and bike’s speed reduces below 10 kmph. On the way, we could see many sheds with the farms of flowers. We reached the base of the fort in two hours.
20180324_073236
There were some people getting down and a group of four people starting ascend. From the base, we could see a bastion and fortification. There are no steps or proper path from this side, so one has to be very careful while climbing up.

We reached the top in 30 minutes. As we reached up, we saw Chor Darwaja with very little space to enter. We had to literally bend down and then get inside. Few steps here took us on the plateau of the fort.

20180324_083401
Further, there is another gate called as Sonori Darwaja. This leads to the path from Sonori village. We could not see the village may be because of a hill.
20180324_083759
Going back straight from Maha Darwaja, we came to another gate of the fort. This goes to Zendewadi village.
20180324_085851
It took us more than an hour to explore and see the entire fort. We then started getting down. There is a proper laid out path which we took to avoid slippery way. We got down in 20 minutes.

We thought of visiting the Panse Wada which is in Sonori village. The road to this village is also in very bad state. We asked locals about the direction to the palace and got to know that there are actually two palaces. The first one was closed and is supposedly opens on Sundays.

We went ahead to see the second palace. This is where Panse, the commander in the Army used to stay. There are six bastions on this palace. It is said that there used to be a place for elephants and horses inside. There are some wells and temples. The idol in Laxminarayan temple and its sandalwood pillars had been brought from Karnataka and placed here.

The eastern gate is is ruins and it has now become a road passing through the palace. Government needs to provide attention before such a heritage place gets destroyed.

Covering Dive ghat, Mastani lake, Malhargad fort and Panse palace, we returned back to home.

 किल्ले सोनोरी उर्फ मल्हारगड

महाराष्ट्रातील काही किल्ले पिकनिक स्पॉटस बनलेत मात्र काही किल्ले इतिहास उगाळीत आपले शेवटचे काही क्षण मोजत आहेत. असाच चाकोरीबाहेरील एक किल्ला म्हणजे किल्ले सोनोरी उर्फ मल्हारगड. पुण्यापासून साधारण ३० किमी अंतरावर तर दिवे घाटापासून १०-१२ किमी अंतरावर मल्हारगड आहे. दिवे घाट संपल्यावर डावीकडे झेंडेवाडी गाव आहे. झेंडेवाडीतून एक खिंड पार केल्यावर सोनोरीचे दर्शन होते. मल्हारगडावर जाण्याचा सर्वात सोपा मार्ग सोनोरी गावातून जातो. सासवडच्या अलीकडे सोनोरी गाव आहे. सोनोरी गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते.
गडाची उंची फारशी नाही १० ते १५ मिनिटात गडमाथा गाठता येतो. एका टेकडी वजा पठारावर किल्ला बांधलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे. गडाची तटबंदी बरीचशी ढासळलेली आहे. काही वाड्यांचे अवशेष, प्रवेशद्वारे, विहिरी, बांधलेलं तळ, एक शिव मंदिर व एक खंडोबाचे मंदिर या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे विशेष काही नाही. गडावरून दिवे घाट, पुरंदर, सासवड, जेजुरी पर्यंतचा प्रदेश दृष्टीपथास येतो.




http://anandgodse.blogspot.com/2014/04/blog-post.html
 
 
 

History of Malhargad, Saswad.

को

मल्हारगढ़

http://www.panoramicearth.com/4551/Pune/Malhargad_Fort

किले की ऊंचाई : 3100 फीट | प्रकार : पहाड़ी किले | जिला : पुणे |
किला रेंज: भुलेश्वर | ग्रेड: आसान

महाराष्ट्र में निर्मित अंतिम किला मल्हारगढ़ माना जाता है। वेल्हा तालुका में पुणे के पश्चिम में सह्याद्रि पर्वतमाला दो भागों में विभाजित है, जिनमें से एक पर राजगढ़ और तोरणा के किले हैं, जबकि दूसरी पर्वतमाला पर सिंहगढ़, पुरंदर, वज्रगढ़ और मल्हारगढ़ के किले हैं। इस श्रेणी को भुलेश्वर श्रेणी के नाम से जाना जाता है जो पूर्व-पश्चिम दिशा में फैली हुई है। माना जाता है कि यह किला पुणे-सासवड मार्ग पर 'दिवे' घाट पर निगरानी रखने के लिए बनाया गया था। किला 1757 ई. से 1760 ई. की अवधि के दौरान बनाया गया था। इसके आधार पर स्थित सोनोरी गांव के कारण इसे सोनोरी के नाम से भी जाना जाता है।


पुणे के पास मल्हारगढ़ किले का हवाई दृश्य।

इतिहास :

किले का निर्माण पेशवा सरदार पानसे ने करवाया था, जो पेशवाओं के तोफखाना का मुख्य प्रभारी था। ऐतिहासिक दस्तावेजों में बुजुर्ग माधवराव पेशवे की किले यात्रा के उद्धरण उपलब्ध हैं। पांसे का एक अद्भुत महल सोनोरी गांव में देखा जा सकता है। इसके अलावा यहां भगवान श्री कृष्ण का एक मंदिर भी देखा जा सकता है। किले का उपयोग दिवे घाट और आसपास पर नज़र रखने के लिए किया जाता था।

आकर्षक स्थान:

मल्हारगढ़ एक छोटा किला है और इसे 30-45 मिनट में पूरा देखा जा सकता है। इसके अधिकांश किले और गढ़ जीर्ण-शीर्ण अवस्था में हैं।

किला शीर्ष:

जैसे ही हम पूर्वी प्रवेश द्वार से प्रवेश करते हैं और बाईं ओर बढ़ते हैं, हमें कुछ महलनुमा अवशेष मिलते हैं। इसके अलावा यहां एक कुआं (जो सूख चुका है) भी देखा जा सकता है। अब किलेबंदी के साथ आगे बढ़ने पर (गढ़ में प्रवेश करने की बजाय) एक तालाब दिखाई देता है। यह तालाब बारिश और सर्दियों के दौरान पानी से भरा रहता है। पानी का उपयोग किया जा सकता है, लेकिन पीने के लिए नहीं।

एक और कुआँ किले के शीर्ष पर गढ़ के रास्ते में स्थित है। यह भी सूख गया है। इस गढ़ के नीचे एक प्रवेश द्वार देखा जा सकता है, जो अवरुद्ध हो गया है। अब हम गढ़ के दाहिनी ओर बढ़ते हैं और एक छोटा सा प्रवेश द्वार दिखाई देता है। ज़ेंडेवाडी बेस-गांव से किले की ओर आते समय, हम इस द्वार से किले में प्रवेश करते हैं।

गढ़ पर दो मंदिर अगल-बगल बने हुए हैं। छोटा मंदिर भगवान खंडोबा का है और बड़ा मंदिर भगवान महादेव का है। भगवान खंडोबा के मंदिर के कारण ही किले का नाम मल्हारगढ़ रखा गया है। प्रवेश द्वार गढ़ के उत्तर में स्थित है।

पांसे का महल:

सोनोरी के आधार-गांव में, पांसे का शानदार छह-गढ़ महल अवश्य देखने योग्य है। इस हवेली में भगवान गजानन और भगवान लक्ष्मी-नारायण का मंदिर है। सोनोरी गांव के मंदिर में भगवान श्री कृष्ण की सुंदर नक्काशीदार काले पत्थर की मूर्ति की पूजा करना और फिर किले के लिए आगे बढ़ना उपयुक्त है।

पहुँचने के तरीके:

मल्हारगढ़ के किले के शीर्ष पर पहुंचने के दो रास्ते हैं।

ज़ेंडेवाडी गांव के माध्यम से:

पुणे-सासवड मार्ग के साथ दिवे घाट के बाद ज़ेंडेवाडी गांव के लिए एक ऑफ-शूट मार्ग है। ज़ेंडेवाडी गांव कहां है? इस शाखा से लगभग 2 कि.मी. की दूरी। यहां ज़ेंडू के कई बागान देखे जा सकते हैं। इस गांव से गुजरने के बाद हमें एक दरार पर पहुंचना पड़ता है, जहां तक ​​मल्हारगढ़ दिखाई नहीं देता। इस दरार से आधे घंटे में अच्छी तरह से मजबूत मल्हारगढ़ पहुंचा जा सकता है।

सोनोरी गांव के माध्यम से:

यह गांव सासवड से 6 किमी की दूरी पर स्थित है। प्रतिदिन तीन बसें सासवड से सोनोरी के लिए प्रस्थान करती हैं। इस गांव से मल्हारगढ़ दिखाई देता है। कोई पहाड़ी की चोटी के साथ किले पर चढ़ सकता है, और टॉवर के किनारे से चलते हुए, हम किले के प्रवेश द्वार पर पहुँचते हैं।

आवास सुविधा :

गढ़ पर भगवान महादेव के मंदिर में केवल 5-6 लोगों को ही ठहराया जा सकता है। इसके अलावा कोई सोनोरी या ज़ेंडेवाडी के स्थानीय स्कूलों में भी रह सकता है।

भोजन सुविधा :

भोजन की व्यवस्था स्वयं करनी पड़ती है।

पेयजल सुविधा :
पीने का पानी स्वयं लाना होगा। किले पर पीने लायक पानी उपलब्ध नहीं है।

पहुंचने का समय:
सोनोरी से 45 मिनट। ज़ेंडेवाडी से 60 मिनट।

 न सोनोरीकडं निघालो. 

पानसे वाडा प्रवेशद्वार 
सरदार पानसे पेशव्यांच्या तोफखाण्याचे प्रमुख होते. इ.स. १७५७ ते १७६० या काळात पानसे यांनी मल्हारगड बांधला. मल्हारगड, महाराष्ट्रात सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला आहे. दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. मल्हारगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी गावात पानसे यांचा वाडा आहे. सोनोरी गावात शिरताच दोन भरभक्कम बुरुजात बांधलेलं प्रवेशद्वार नजरेस पडत व त्याला लागून असलेली तटबंदी. वाडयात गजाननाचे व लक्ष्मीनारायणाचे सुंदर मंदिर आहे. सभामंडपातून गाभाऱ्याकडे जाताना देवडीत रथावर आरूढ असणाऱ्या देवतेचं शिल्प पहायला मिळतं. 

                                 लक्ष्मीनारायण मंदिर

हि देवता म्हणजे सूर्यदेव. वेदांमध्ये सूर्यला आत्मा म्हंटले आहे तर यजुर्वेदामध्ये चक्षो सूर्यो जायत म्हणजे भगवंताचे डोळे. वेदकाळात प्रथम मंत्रा द्वारे सूर्याची पूजा केली जात असे यानंतर मूर्ती व त्यानंतर सूर्याची मंदिरे बांधली गेली. पुराणात सूर्य हा ऋषी कश्यप व आदितीचा पुत्र म्हणून उल्लेख आहे. सूर्याला छाया व सज्ञा या दोन पत्नी आहेत. शनी,यम, अश्विन कुमार व यमुना नदी व महाभारत मधील कर्ण हे सूर्याचे पुत्र पुत्री आहेत. सूर्याच्या मूर्तीचे दोन प्रकार पहायला मिळतात एक रथावर आरूढ असलेली सूर्यदेवाची मूर्ती तर दुसरा दोन्ही हातात कमळ घेतलेली मूर्ती. या मंदिरात रथावर आरूढ असलेली मूर्ती आहे. ज्यात रथाला सात घोडे व सारथी अरुण तर एक हात मुद्रेत व दुसऱ्या हातात कमंडलू असलेले ध्यानस्थ सूर्यदेव आहेत.

मंदिर पाहून मंदिराच्या मागे असलेल्या प्रवेशद्वाराने आत गेलो. तिथं काही खोल्या दिसल्या, आतमध्ये एक आज्जी होत्या आम्हाला वाटलं असंच आल्या असतील पण या आजी इथंच वास्तव्याला आहेत त्यांना विचारून आतमध्ये गेलो. आत बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे. दगडीतळखडे व त्यावर लाकडी खांब लावून छत उभारलं आहे. तिथेच कारंज सुद्धा आहे. उजव्या हाताला तीन खोल्या आहेत त्यांना कुलुपं होती तर डाव्या हाताला एक खोली आहे तिथं या आज्जी रहात असत. आजींसोबत गप्पा मारत काही काळ तिथंच थांबलो. ह्या वाड्यात या आज्जी एकट्या राहत होत्या तर बाकीचे कुटुंबीय सगळे पुण्यात रहायला होते.

आपल्या पूर्वजांचा वारसा सांभाळत या अज्जी इथच रहात होत्या पण ह्या पडक्या वाड्यात एकटं राहणं थोडं हॉररच वाटत होत. सहा बुरुजांची तट बंदी असलेला हा वाडा झाडी झुडपांनी वेढलेला आहे, काही ठिकाणची तटबंदी ढासळलेली आहे. वाड्याकडे सहसा कोणी फिरकत नाही त्यामुळं हा वाडा दुर्लक्षित आहे. वाड्यापासून थोडं पुढं एक बारव आहे. जुन्या काळात बांधलेली दगडी बारव आहे. पाणी उपसणायसाठी इथे अगोदर मोट होती त्याचे अवशेष पहायला मिळतात. गावकरी पिण्यासाठी इथल्याच पाण्याचा पाण्याचा वापर करतात. दहा वाजत आले होते रविवारी सुद्धा आम्हाला टाईम लिमिट असल्यानं सकाळी १० पर्यंत सगळं उरकत घेऊन निघालो. आज सासवड मधील पुरातन मंदिर व पानसे यांचा वाडा झाला.


 

गणराय 

पानसे वाडा 



https://maheshnilangekar.blogspot.com/2020/04/blog-post_7.html
 

Short trek to Malhargad Fort / Sonori Fort

After Mangad and korigad fort, we were planning one more offbeat trek. As my parents were interested to join us, we decided to visit the Malhargad Fort. This fort is also known as Sonori Fort. We were expecting light rain shower but it was neither rainy day nor sunny day.

Trekkers for Malhargad were Me, Wife Renuka, Sister Pratima and my parents.

About Malhargad / Sonori Fort:
            Malhargad is located near Saswad, around 47km from Kothrud, Pune. It is also known as Sonori Fort due to the village Sonori situated at the base of the fort. This fort was built in the year 1775 by Peshwa Saradar Krishnaji Madhavrao Panse who was the chief in charge of Tofkhana (Cannon department) of the Peshwa. Fort is said to be the last fort built in Maharashtra by Maratha Empire.

There are two ways to reach at the base village Sonori. One is Pune – Kothrud – Warje bypass – Take a right towards Katraj on bypass highway – Do not go on Navale flyover – Take left side road and take left for Ambegaon – Katraj – At Katraj Chowk, Take right and immediate left for Katraj-Kondhwa road – Drive till T junction and take right and immediate left for Katraj-Saswad Road – On T junction take right for Dive ghat – Dive ghat – Saswad – Ask for Jaydeep Wedding hall – Follow same road till Sonori village – Drive for 1.5 km from village towards Fort base.

Road from Sonori village is not a tar road hence you may need to park the vehicles at Sonori.

Another route is Pune – Swargate – join Pune-Solapur highway – Hadapsar – After Magarpatta Chowk do not take Flyover – Take right turn below flyover for Saswad road (New flyover to take right is under construction) - Dive ghat – Saswad – Ask for Jaydeep Wedding hall – Follow same road till Sonori village – Drive for 1.5 km from village towards Fort base.

There is another trek route from village Zendewadi. For Zendewadi, take left once you climb Dive ghat. This side takes 1.5 hours to climb Malhargad fort as you need to cross small hills before actual climb.

28nd June 2015: Trek to Malhargad/Sonori fort (Total Distance traveled: 96 km)
             On late Saturday evening, we decided to go for a trek on Sunday. We woke up morning by 6 AM and left Pune by 7 AM. Weather was perfectly set for trekking conditions but it changed its mood and Sun started dominating all over the sky. It was a pleasant journey to Sonori village via Dive ghat. From dive ghat, you can see Mastani Lake. Mastani was the second wife of Peshwa Baji Rao I. She is said to have been a beautiful and brave woman. It is believed that while in Pune, Mastani used to go for her bath to a lake made by Bajirao especially for Mastani. We parked our car at the fort base. You can see beautiful view of Fort Malhargad from the base and it’s easy to spot the trekking route to the fort.



           We started walking towards the Fort base. From parking point you will come across a small rough road. Follow this road for around 100-200 meters which will take you to a base of fort. Trust me there is no define route to reach at the top. You can climb from any side and reach at the fort bastion. Mainly trekkers follow the right side route (When your facing to fort) to reach at the main entrance gate. Climbing from left side of the fort takes you to the back side of fort.
             Climb to the top of the fort should take less than one hour. As my parents (age 60+) were climbing with me, we took breaks at regular intervals to gain energy. After 1.25 hour of hike, we reached on top of Fort. Soon we reached the first gate of the Malhargad fort. Main entrance is in good condition. You can see ruined rooms on both sides of the gate. Overall fort head area is small in size. You need around 2 hours to see in detail else 1 hour is enough to explore the fort.

Entrance Bistion of Malhargad fort
Entrance Bastion of Malhargad fort

Info Board on Fort

Entrance Gate

           On the small plateau, you can see small square shape platform and a well. Entrance to Bale Killa (Small fort OR Main fort constructed above fort) is on the right side. Once you enter inside the fort from the gate, you can see two temples side by side. Smaller temple is of Lord Khandoba and the larger temple is of Lord Mahadev. The fort has been named Malhargad because of the temple of Lord Khandoba. Lord Khandoba is also known as Lord Malhar. Bale Killa is small in shape. Just besides Bale Killa, you can see larger size water trench. The Maratha’s purpose behind the building Malhargad was to keep an eye on Dive Ghat which is along the Pune-Saswad route.

Fort view from Entrance Bastion
Fort view from Entrance Bastion  

A well on fort

Entrance to Bale killa, Malhargad
Entrance to Bale killa

Lord Mahadev and Lord Khandoba temples
Lord Mahadev and Lord Khandoba temples

            We explored other parts of the fort and two bastions. After exploring fort area, we had homemade packed breakfast on the fort. Peace of the fort, nature’s beauty with cool breeze was best way to get refresh. After sightseeing and breakfast, we started descending at 10.30 AM. For descend we chose south-east route (i.e. left most bastion). This route was longer one as compare to other but easy for my parents to get down safely. We reached at the base within 30 min. After we reached at our parked vehicle at base village, we left this historical place. There is a Peshwa Saradar Panse’s palace in the Sonori village. Palace is in ruined condition along with wall, bastion and Temple. We left Sonori village for Pune by 12.30 PM and reach home safely after lunch by 3 PM.

Water Trench on Malhargad Fort
Water Trench on Malhargad Fort

Malhargad Fort area
Malhargad Fort area

Lord Mahadev temple


Things to carry for Malhargad trek:
  • A water bottle to carry at least 2 liters of water 
  • Some dry food, in case you don’t find any suitable food stall 
  • Windcheater / jacket / Barsati during monsoon trek. 
  • Do carry instant energizers like Glucon-D or Tang. (Not required for monsoon treks) 
  • A towel or napkin and 2-3 old newspapers 
  • Camera to capture best nature movement 
  • Better avoid wearing Gold and other ornaments. 
  • No need to carry heavy cash. 

Our Expenses:
  • Car petrol: INR 500/- (approx. 7.7 lit at INR 74.72/lit) 
  • No Expenses on Breakfast as we were caring food from home. Do not expect food in Sonori village so better to have some snacks at Saswad. 
  • Lunch: INR 700/- for 4 person (soup, starter, vegetable dish and Roti)

For Lunch, there are few hotels at Saswad and near dive ghat. There is luxury restaurant named Jadhavgad restaurant near ghat.

Entrance of Malhargad Fort
Entrance of Malhargad Fort
Entrance Gate
Malhargad Fort View
Malhargad Fort View

Temples on Fort

180 degree Panorama photo of Malhargad fort
180 degree Panorama photo of Malhargad fort

iPhone Photography...

Thanks for reading this Travel Blog. Happy traveling.  
 
 

मल्हारगड/सोनोरीचा किल्ला, पानसे-वाडा

आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.
सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.
आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस. सोनोरी गाव. 

गावात हनुमान मंदिरा मध्ये कसलातरी उत्सव भरला होता. बरीच मंडळी जमलेली होती. तेथून लांबूनच दर्शन घेऊन निघालो किल्ल्याच्या अगदी पायथ्यापर्यंत. गावात मुरलीधर मंदिर म्हणून कृष्णाचे खूप सुरेख मंदिर आहे असे ऐकले होते. शोधत शोधत तेथे गेलो. मंदिर फार काही चांगल्या अवस्थेत नव्हते. आजूबाजूला घरांचा आणी कचऱ्याचा वेढा पडला होता. तेथे जाऊन बंद मंदिर बघून आजूबाजूला विचारू म्हंटले तर आजूबाजूला कोणीच नाही. फक्त कोंबड्या. मग एका कोंबडी ला घाबरवल्यावर ती ओरडत एका घरात गेली आणी मग तेथून एक आजोबा प्रकट झाले. 
"ह्ये मंदिर बंदच असते. कधीतरी सुट्टीच्या दिवशी मालक येतात न उघडतात. पुण्याला असतात म्हणे."-  इति आजोबा. 
असो नो प्रोब्लेम. तेथून सुटलो आणी पोहोचलो पानसे वाडा.

मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते.त्यांचाच हा वाडा. आजही इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा आपल्या भक्कम ६ बुरुज आणी अजूनही सुस्थितीत अशी तटबंदी अश्या बाहूबंदीने उभा आहे.
पानसे वाडा मुख्य दरवाजा.


मल्हारगड : सुमारे इ. स. १७५७ ते १७६० या काळातबांधला गेलेले शेवटचा किल्ला. किल्ल्यावर लावलेल्या पाटीवरही तशी नोंद आढळते.स्वराज्यातील हा शेवटचा किल्ला असल्याचे तेथे असलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी ६-७ फुट असावी पण बाकी किल्ल्यांची रचना लक्षात घेता ह्याची रचना फारच सरळसोट वाटली.
 असो. पानसे वाड्यावरून ५ मिनिटात गाडीवर पायथ्याशी आलो. लांबच लांब मोकळ्या ढाकळ्या जागेत मल्हारगड वसलेला आहे. जास्त लोकांना माहिती नसल्याने याचा पिकनिक स्पॉट झालेला नाही म्हणून का काय इथली जागा अजूनही स्वछ आहे. थोडी थोडकी कौलारू घरे, काही झोपड्या, आणी काही शेती. बाकी डोंगरच डोंगर.

मल्हारगडाचे पायथ्यावरून दर्शन.
पूर्ण निर्मनुष्य प्रदेश, "किल्ला चढून ये वरती, वरती भेटू!" म्हणत सुर्यनारायण अस्ताकडे निघालेले , उन्हे कललेली, भूस-भुशीत मातीत टायरची नक्षी काढत आणी धुराळा उडवत अस्मादिक एका घरापर्यंत पोहोचले. तेथे घरात असलेल्या मंडळींच्या साक्षीने गाडी त्यांच्या घरासमोर लावून किल्ल्याची वाट विचारून निघालो. सुमारे ५ वाजत आले होते आणी मला सूर्यास्ताच्या आत वरती जायचे होते. पावले झपझप पडायला लागली. इलेट्रिक टॉवर च्या दिशेने चालु लागलो.
किल्ला थोडा दृष्टीपथात येताच मुख्य वाट सोडून सरळ धारेवर चढाई चालू केली. अर्ध्या तासात प्रवेशद्वाराशी पोहोचलो.  न थांबता चढाई करून आल्याने थोडा दम लागलेला म्हणून तसाच एका खंदकात बसलो. उठताना लक्षात आले की, पाठीवर रेलून बसलोय आपण आणी ब्याग मधल्या अंजीरांची भेळ झालीये.


मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच समोर छोटेखानी किल्ला दिसू लागला. आजही शाबूत असलेले भलेमोठे बुरुज दिसू लागले.


मुख्य तटबंदीला समांतर असे बालेकिल्ल्याची तटबंदी आणी चोर दरवाजा दिसू लागला.


चोरदरवाजा :
एक वाट दिवे घाट सुरु होण्यापूर्वी लागणाऱ्या झेंडेवाडी गावातून येते. तेथून एक छोटासा डोंगर चढून आपण या चोर दरवाज्याशी येतो.


संपूर्ण दिवे घाट आणी परीसर यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केलेली होती. या बुरुजावरून दिवे घाट आणी परीसर दृष्टीस पडतो.


बालेकिल्ला दरवाजा :


बालेकिल्ल्यात दोन छान मंदिरे आहेत. एक महादेवाचे आणी एक खंडोबाचे. देवाचे बाहेरूनच दर्शन घेऊन थोडा वेळ मस्त फ्रेश हवा खात बसलो.

पूर्ण किल्ला भटकून घेतला. सगळ्या बुरुजातून खालीडोकावून पाहून झाले. सगळ्यांचे फोटो काढून झाले. मग आता थोडा वेळ येथून टेहळणी करत बसलो.


पश्चिमेच्या कागदाला जसा जसा केशरी रंग चढू लागला तसा उतरायला चालू केले. मुख्य वाट सोडून एका घासार्यावरून घसरत डायरेक्ट पायथ्याला पोहोचलो.

 
 
तोफखाना प्रमुख सरदार पानसे
आज सोनोरी गावी जाण्याचा योग आला, सरदार पानसे यांच्या वाड्याला भेट दिली, वाड्याची खूपच पडझड झालेली आहे, काही अवशेष शेवटची घटका मोजत आहेत. वाडा जतन होणे आवश्यक होते. वाड्यात पानसे काकी भेटल्या, त्यांनी काही माहिती हतबल होऊन दिली. वाड्यातील काही भाग सुस्थितीत आहे, तिथे त्या राहतात. सरदार पानसे यांचे पूजेतील देवघर अजून सुस्थितीत आहे. सरदार पानसे यांचे वंशज यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच गावकर्‍यांनी सुद्धा अनमोल इतिहास जतन करणे आवश्यक आहे.
साभार 
 
 


See author's posts


पुणे–अहमदनगर मार्गावर, पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर, वाघोली या गावात पेशव्यांच्या काळातील सरदार पिलाजीराव जाधव यांचे ते वाडे त्यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि वैभवाची स्मृती जपून आहेत.

वाघोली गावात प्रवेश केल्यावर, गावाच्या मध्यभागी, सुस्थितीत असलेली वेस पाहण्यास मिळते. पूर्वी ती गावाच्या सीमारेषेवर होती. मात्र गावाचा विस्तार वाढत गेल्यानंतर ती आता गावाच्या मध्यभागी आली आहे. पंचवीस फूट उंचीच्या त्या वेशीचे चिरेबंदी बांधकाम गेली अडीचशे वर्षें ऊन, पाऊस, वादळ-वारा, थंडी यांना झेलत ताठ उभे आहे. वेशीची सुबक कमान पेशवेकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.

वेशीतून आत प्रवेश केला, की थोड्याच अंतरावर सरदार पिलाजीराव जाधव यांचा वाडा आहे. वाड्याची तीस-पस्तीस फूट उंचीची तटबंदी पाहून वाड्याच्या भव्यतेची सहज कल्पना येते. तटबंदीजवळून पुढे सरकल्यावर उजव्या हाताला वाड्याचा प्रचंड दरवाजा नजरेत भरतो. त्यावरील कमळांची शिल्पे चित्त वेधून घेतात. दरवाजावरील वीटकामातील सज्जा मात्र पूर्णपणे ढासळला आहे. त्यासाठी वापरलेले लाकूडही जराजर्जर झाल्याचे दिसते. तरीसुद्धा तो सागवानी दरवाजा जाधवांच्या महानतेची जाणीव पाहणाऱ्याला करून देतो.

दरवाजातून प्रवेश केल्यावर झाडा-झुडुपांच्या आत दडलेली तेथील इमारतींची चिरेबंदी जोती आणि त्यांचे टोलेजंग स्वरूप दृष्टीपुढे उभे राहते. त्या वाड्यात पूर्वी आग लागून बऱ्याच गोष्टी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे तेथे इमारतींच्या जोत्यांशिवाय व आतील चौकांशिवाय काही नाही. जाधवरावांच्या सध्याच्या वारसदारांपैकी संग्रामसिंहराव यांच्याकडून आतील मूळ वाडा सहा मजल्यांचा होता असे समजले.

वाड्याच्या बाहेर पडून सात-आठ पायऱ्या उतरल्या, की वाड्यासमोरचा रस्ता लागतो. तेथून दुसऱ्या वाड्याकडे जाणारी वाट आहे.

जाधवरावांच्या दुसऱ्या वाड्याचीही तटबंदी तिचा भक्कमपणा टिकवून आहे. मुख्य दरवाजा दुरुस्त केल्यामुळे चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची कमान सुस्थितीत असून तिच्यावरील सज्जांचे बांधकाम नवीन केले आहे. त्यामुळे तेथे जुन्या-नव्याचा संगम पाहण्यास मिळतो.

दरवाजातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंच्या ढेलजा (रखवालदाराच्या चौक्या) रेखीव सागवानी खांब आणि तुळया यांवर भक्कमपणे उभ्या असलेल्या दिसतात. वाड्याचे जोते चिरेबंदी आहे. त्या चौसोपी वाड्याच्या दोन सोप्यांच्या जोत्यांवर नवीन बांधकाम करण्यात आले आहे. तेथे सरदार पिलाजीराव जाधव यांचे वंशज रामचंद्रराव वास्तव्य करत आहेत.

वाड्याच्या जवळपास जाधवरावांनी राममंदिर, हनुमान मंदिर, गणेश मंदिर, भैरवनाथ अशी अनेक मंदिरे बांधली. ती सारी गावाची श्रद्धास्थाने झाली आहेत. आजही त्या मंदिरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांनी गावात नवे चैतन्य निर्माण होते.

गावातून बाहेर पडल्यावर पुणे-अहमदनगर मार्गाच्या पलीकडे सरदार पिलाजीराव जाधव यांची भव्य छत्री (समाधी) आहे. त्या भव्य चौथऱ्यावर घोटीव पाषाणातील सुबक बांधकाम आहे. समाधीजवळच जाधवराव घराण्यातील इतर पुरुषांच्या समाधी दिसतात.

पिलाजीरावांच्या समाधीपासून आठ-दहा मीटर अंतरावर सरदार पिलाजीरावांनीच बांधलेले वाघेश्वराचे भव्य मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम उत्तम प्रकारच्या कातीव (घडीव) दगडांचे असून ते सुस्थित आहे. मंदिरावर कोरलेली शिल्पे नेत्रसुखद आहेत. मंदिरासमोरील नंदी त्या वास्तूच्या भव्यतेत भर घालतो. ते मंदिर पेशवेकालीन मंदिररचनेचा उत्तम नमुना आहे. मंदिरातील शिवलिंग आळंदीजवळील चऱ्होली गावातून आणण्यात आले होते. बाजीराव पेशव्यांनी तेथील तळ्याजवळील बागेसाठी जमीन दिली होती. ते स्थळ सरदार पिलाजीराव जाधव यांची भव्य छत्री, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या समाधी, शेजारील विस्तीर्ण तलाव, भव्य आणि सुंदर असे वाघेश्वर मंदिर या गोष्टींमुळे विलोभनीय झाले आहे. तेथील तळ्यात नौकानयनाची सुविधा केल्यामुळे ते स्थळ पुणेकरांच्या सहलीचे ठिकाण बनले आहे.




वाघोलीचा वाघेश्वर




         तुळापूर येथून निघून 20 मिनटात वाघोलीला असलेले वाघेश्वर मंदिर पाहण्यासाठी निघालो. पुणे-नगर मार्गावर पुण्यापासून 20 कि.मी. अंतरावर वाघोली हे गाव आहे. येथे  पुरातन वाघेश्वर मंदिर, हनुमान मंदिर,भैरवनाथ मंदिरे प्रसिद्ध आहेत. हे मंदिर हेमाडपंती स्थापत्य शैलीतील आहे. तसेच  पेशवाईतील शूर कर्तबगार सरदार पिलाजीराव जाधवरावांची समाधी आहे.
          वाघेश्वर मंदिराची रचना ही चौकोनी गाभारा, सभा मंडप, भिंतीवरील अनेक कोनाडे, शिखराची रचना टप्प्याटप्प्याची खालच्या टप्प्यापेक्षा वरचा टप्पा लहान होत जाणारा. त्यामुळे मंदिराकडे पाहिल्यास आपली नजर सरळ  वर न जाता ती आडव्या रेषामध्ये जाते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख आहे. मंदिरासमोरील नंदी मंदिराच्या भव्यतेत भर घालतो. नंदी पांढ:या रंगात रंगवलेला आहे. मंदिराच्या बाहेरील प्रत्येक स्तंभाची रचना कलशावर कलश मांडून त्यावर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या बाहेरील खांबावर दगडी शिल्पामध्ये राम अवतार, बळीवामन, शेषशाही विष्णू, नृसिंह अवतार, वराहअवतार, गरुड देवता, हनुमान, मत्स्य अवतार, कच्छ अवतार,यक्ष, व्याल, महिशाशूरमदिर्नी, मल्ल, व्याल,कल्की अवतार, गणोशमूर्ती, नागदेवता, सहस्त्न भाऊ आणि परशुराम युद्ध ,अश्वमेध यज्ञ, घोडा अशा शिल्पकृती दगडावर कोरलेल्या आहेत.  मंदिराजवळ असणारा  तलाव  पर्यटकांचे आकर्षण ठरू लागला आहे ते येथील बोटिंगमुळे. संध्याकाळचे 7.30 वाजल्यामुळे मला फोटो काढता आले नाही.


पिलाजी जाधवराव :
पिलाजीरावांनी तलावाच्या शेजारील  वाघेश्वर  मंदिराजवळ बागेसाठी पेशव्यांकडे जागेची मागणी केली होती. गावातील लोकांना पाण्याची अडचण दूर होण्यासाठी तलाव बांधला. ही मागणी बाजीराव पेशव्यांनी 1722  मध्ये मान्य करून पिलाजी आणि संभाजी जाधव रावास जमिन दिली.   पिलाजीरावांनी  दिवेघाटात तलाव बांधला. तो मस्तानी तलाव म्हणून प्रसिद्ध आहे. दिवेघाटात वर पोहचल्यावर खाली नजर टाकल्यास मोठा पाण्याचा कोरडा तलाव दिसतो हाच तो मस्तानी तलाव. मध्यंतरी पेपरात तलाव साफ करण्याच्या बातम्या झळकल्या होत्या. 1729 च्या पूर्वी या तलावाची बांधणी  पिलाजीरावांनी केली. पुढे बाजीरावांकडे हा तलाव आला.

सरदार पिलाजीराव जाधवांची समाधी
मंदिराशेजारी पाषाणातील सुबक बांधकाम असलेली पिलाजीरावांची समाधी आहेत. या समाधीजवळच जाधवराव घराण्यातील अनेक पुरु षांच्या समाध्या दिसतात. 








No comments:

Post a Comment

Aihole

 आयहोळ येथील डोल्मेन :        सध्या बहुतेक पर्यटक आयहोळला चालुक्यांच्या सुरवातीच्या काळात बांधलेल्या मंदीरांना भेट देण्यासाठी येतात. मात्र ल...