Monday, February 19, 2024

सासवड परिसरात

  महाराष्ट्राच्या शौर्यधैर्यादी वीर वृत्तीचे उगमस्थान त्यांचा आवडता सह्याद्री होय. सह्याद्रीची उत्तुंग शिखरे, बिकट कडे, खोल दऱ्या आणि त्याच्या आश्रयातील घनदाट अरण्ये ही आम्हां मराठ्यांच्या महाराष्ट्र वृत्तीची जननी आहे.
      बापदेव घाटाजवळ एक दक्षिणोत्तर जाणारी डोंगररांग दिसते. पूर्वेच्या उजव्या बाजूस पुण्यापासून १० मैलांवर दिवे घाटाची दरड उभी आहे. दिवे घाट चढून गेले की, कऱ्हे पठाराची सीमा लागते. पूर्व-पश्चिम जाणारी ही डोंगररांग कर्णाकृती होऊन १०-२० मैल जाऊन विराम पावते. या पठाराच्या पूर्वेस आनंद भैरव नांदतो. साबगर खिंड, पानवडीची खिंड, पांगर खिंड आणि पुरंदर गड, वज्रगड, जेजुरीगड प्रसिद्ध स्थळांत मोडतात. सिंहगड रांग व पुरंदर रांग या दोन्ही एका ३-४ मैलांच्या रांगेने एकमेकांस संलग्न होतात.
आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता!
     आणि ह्या तिन्हीही रांगामुळे एक मोठे विस्तृत पठार तयार झाले आहे, या पठाराला कऱ्हे पठार म्हणतात. या पठाराची व्याप्ती सुमारे १०० चौरस मैलाची आहे. या पठाराच्या एका टोकास भुलेश्वर व दुसऱ्या टोकास मल्हारी मार्तंड उभे आहेत. आणि या पठाराच्या गर्भातून कऱ्हामाईचा झुळझुळ प्रवाह वाहत आहे. या प्रदेशावर पुराणप्रसिद्ध व इतिहासप्रसिद्ध अनेक स्थळांची गर्दी झालेली दिसून येईल.





    पुरंदरचा हा कऱ्हा पठार जशी आध्यात्मिक अधिष्ठान असलेली पवित्रभूमी आहे. त्याबरोबरच पावलो पावली दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या जिगरबाज लढवय्यांची ही भूमी आहे. पुरंदरमधील गराडे गावाजवळ असणाऱ्या पठारवाडी परिसरात उगम पावते कऱ्हामाई. ब्रह्मदेवाच्या वास्तव्यामुळे या भागाला ब्रह्मगिरी किंवा चतुर्मुख डोंगरही म्हणतात. पांडवांमार्फत तपश्चर्या भंग झाल्याने ब्रह्मकमंडलूतून येथेच निर्माण झाली कऱ्हा नदी. पुढे काही अंतरावर वारवडी या गावी कऱ्हामातेचे मंदिर व उगमाचे प्रतीक कुंड पाहायला मिळते. पुढे पुरंदरमध्ये कऱ्हेच्या काठावर अनेक शिवमंदिरे उभारली गेली. कऱ्हा नदीच्या काठावर वसलेले सासवड म्हणजे निसर्गाची अलौकिक देणगी लाभलेला प्रदेश. कऱ्हा नदीकाठी बापदेव व दिवे घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-सातारा रस्त्यावर सासवड हे चिमुकले गाव वसले आहे.खरे तर मध्ये दिवे घाट नसता तर हे गाव पुण्याचे एक उपनगर झाले असते. ह्या सासवडाचा वारसा मात्र शिवकाळाच्याही आधी जातो तो थेट यादवकाळात. आकाशाला भेदून ताठ मानेने उभ्या असलेल्या कऱ्हा काठच्या उंचच्या उंच डोंगर रांगा. हिरवेगार मळे आणि दाट झाडीत वसलेले सासवड हे वारकऱ्यांसाठी दोन दिवस विसाव्यांचे ठिकाण. एका दिवसात तब्बल तीस किलोमीटरचं अंतर चालून आलेले थकले भागलेले वारकरी याच सासवड मुक्कामी थांबत असायचे.पुरंदरच्या या कऱ्हा पठारात सात गड आणि नऊ घाट आहेत. सासवड हे ऐतिहासिक गाव. शिवपूर्वकाळापासून एक महत्त्वाचे ठाणे म्हणून भौगोलिकदृष्ट्याही त्याचे महत्त्व वेगळे आहे. महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीतले हे गाव. विविध वाटा इथे एकत्र येतात. त्यामुळे त्याकाळी पुण्याच्या संरक्षणासाठी सासवडला महत्त्व होते. याच सासवड आणि परिसरात संगमेश्वर, चांगावटेश्वर, सिद्धेश्वर, नारायणेश्वर अशा देखण्या मंदिरांची निर्मिती झाली. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस संगमेश्वर मंदिराची निर्मिती झाल्याचे अभ्यासक सांगतात. मात्र, ती कुणी आणि नेमकी केव्हा केली याचे उल्लेख नाहीत.
उत्तर यादवकाळातली देखणी वास्तुरचना, कऱ्हामाई आणि चरणावती वा भोगवती (चांबळी) या नद्यांच्या संगमावर वैशिष्ट्यपूर्ण रचनेने लक्षवेधी ठरलेले संगमेश्वराचे मंदिर आज वर्तमानात उपेक्षित आहे. अनेक चित्रपट, मालिका आणि माहितीपटांमध्ये झळकूनही हा वारसा दुर्लक्षित आहे. वारसा अभ्यासकांसह विविध प्रकारच्या चित्रीकरणांसाठी इथे येणाऱ्यांनी त्याच्या या उपेक्षेकडे लक्ष द्यावे, अशी सासवडकरांची अपेक्षा आहे.दुर्दैव म्हणजे, सासवड परिसराचा परकीयांनी जेवढा अभ्यास केला, तेवढा स्वकियांनी अद्याप केलेला नाही. इथली मंदिरे ही इतिहासकाळातल्या समृद्धीची साक्ष देतात. अशी अनेक ठिकाणे आज काळाच्या पडद्याआड आहेत, नव्या पिढीच्या अभ्यासकांनी ती पाहून अभ्यासण्याची गरज आहे.
        सासवड तसं ऐतिहासिक गाव. इथे अनेक जुने पुराणे वाडे आहेत. या गावाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि हे बाळाजी विश्वनाथ (पहिला पेशवा) याच्या काळापासून भट घराण्याचे (पेशवे घराण्याचे) दक्षिणेकडील निवासस्थान होते. उत्तर पेशवाईतील पुरंदरे सरदारांचे हे मूळ गाव होय. या गावात पेशव्यांचा जुना वाडा असून सध्या तेथे तहसील कार्यालय आहे, तर पुरंदरे सरदारांचा वाडा संगमेश्वर मंदिराजवळ आहे. तो तटबंदीयुक्त आहे.कऱ्हा काठावरील 52 सारदारांनीच पेशवाई वाढवली त्या इतिहासाच्या पाऊलखुणा आज ही या ऐतिहासिक भूमीमध्ये पाहायला मिळतात. पुर्वी इथं सहा वाडया होत्या कालांतराने त्याचे गावात रुपांतर झाले.
वटेश्वरापाशी ‘वरखेडवाडी’, सिद्धेश्वरपाशी ‘सरडी’, सदतेहे बोरीचे पटांगण, ‘संवत्सर गांव’ सोपानदेवापाशी, ‘दाणे पिंपळगाव’ टाकमाई मंदीरापाशी, जुन्या भैरवनाथाजवळ ‘सनवडी’ जसा काळ बदलत गेले तसं या वाड्यांचे स्वरूप व विस्तार बदलून त्याचे सासवड गावात रुपांतर झाले म्हणुन सासवड अशी अख्यायिका आहे. 
आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता!
     सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानकाकांची संजीवन समाधी आहे. सासवड मुक्कामी येणारे वारकरी हे सोपान काकांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतात. सासवडमध्ये माऊली आणि सोपानकाकांची भेट झाल्यानंतरच सोपानकाकांची पालखी प्रस्थान ठेवते म्हणजे माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आल्यानंतरच सोपानकाकांची पालखी हे पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवते. इथून पुढे वेगवेगळ्या मार्गाने जाणारे हे भावंडे पुढे वाखरी मध्येच एकत्र येतात.माऊलींची पालखी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते तिथे पालखी तळ बनवण्यात आलेले आहेत.
     इतिहासाचा मोठा पट या परिसराने पाहिला आहे. श्रीशिवरायांनी स्वराज्याचा पाया इथेच घातला. मोगलांशी लढता लढता स्वराज्याचा पहिला सरसेनापती वीर बाजी पासलकर याने येथेच देह ठेवला. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्ला येथून जवळच आहे.. व पेशव्यांनी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचा उपक्रम इथेच केला. शिवकालीन स्वराज्याचे निष्ठावंत शूर सेवक जाधववाडीचे पिलाजीराव जाधवराव, पानिपतच्या संग्रामातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा, नारायणराव पेशवे यांच्या वधप्रसंगी स्वामिनिष्ठेने धन्यास वाचविण्याच्या प्रयत्नांत अंगाच्या खांडोळ्या झालेला एखतपूरचा स्वामिभक्त चाफाजी टिळेकर, अठराशे सत्तावनच्या क्रांतीनंतर इंग्रजांना सतावून सोडणारा भिवडीचा शूर उमाजी नाईक, प्रसिद्ध समाजसुधारक सत्यशोधक महात्मा फुले, लावणीकार पठ्ठे बापूराव व सगन भाऊ, होनाजी बाळा, आचार्य प्र,के. अत्रे, जेजुरीच साहित्यमार्तंंड यशवंतराव सावंत, माळशिरस भुलेश्वरचे प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव आदींच्या कर्तबगारीने, धैर्यशौर्याने उजळून निघालेले हेच ते कऱ्हेपठार. श्री यादव यांनी क-हाकाठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन खानवडी येथे सुरु केले. छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनही गेली अकरा वर्षे ते भरवीत आहेत. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी भरीव काम करुन पुरंदरच्या वैभवात भरच टाकली आहे. यादवकालीन भुलेश्वर, वारीच्या वाटेवर या महाकादंबरीचे ते लेखक आहेत. सासवड येथे २०१४ रोजी झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष होते.
सासवड परिसरात काय पाहाल?
    पुरंदर आणि वज्रगड, संगमेश्वर, सिद्धेश्वर, चांगावटेश्वर, नारायणेश्वर, संत सोपानकाका समाधी मंदिर, ग्रामदैवत भैरोबा मंदिर, मामलेदार कचेरी, पुरंदरे वाडा, सोनोरी गावची वेस, सरदार पानसेंचा वाडा, गावातली मंदिरे आणि मल्हारगड व दिवे गावाजवळील जाधवगढी. या परिसरात येताना किंवा जाताना दिवेघाट पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक तलावालाही भेट देता येईल. चांबळीचा बंधारा, गराडे धरण, बोपदेव घाटमार्गे आल्यास कोडीतचे म्हस्कोबा मंदिर, मरिआई घाट, कानिफनाथ गड आणि या मार्गावरील अनेक जुने वाडे आणि मंदिरे पाहण्याजोगे आहेत.

आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी...| आज कऱ्हा काठ वारकऱ्यांनी फुलून गेला असता!


संगमेश्वर मंदिर: सासवड.
संगमेश्वर मंदिर: सासवड.
 सुरवातीला सासवडमधील एतिहासिक पुरुषांच्या समाधी आणि त्यांच्या कार्यांची माहिती घेउया

पहिले धारातीर्थी : सरसेनापती बाजी पासलकर

स्वराज्याचे पहिले धारातीर्थी : सरसेनापती बाजी पासलकर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या व एकनिष्ठ सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे बाजी पासलकर. मोसे खोयातील मोसे बु. गावाचे हे भुमिपुत्र ‘यशवंतराव’ किताबाने कीर्तीवंत झालेले होते. ८४ मोसे खोयातील हे वतानदार गोर-गरीबांचे आधार होते. रोहिड खोयात आणि गुंजन मावळात त्यांच्या सज्जनतेची आणि दिलदारपणाची ख्याती होती.
  शेडगावकर बखरीत बाजी पासलकर हे मावळे लोकांचे सरदार असल्याचा उल्लेख असून त्यांच्या स्वरूपाची माहिती पुढीलप्रमाणे दिली गेली आहे.
         "बाजी पासलकर झणजे मोठा युधी, शूर मर्दाना, ज्याच्या मिशा दंडा एवढया, मिशास पीळ घालोन केसाचे अग्रावर दोहीकडे दोन निबे ठेवावी व मनगटा येवढे नाक, असे त्याचे स्वरूप विक्राळ. त्यास राजे याणी योजून पाठविला."
सभासद बखरीत बाजी पासलकरांचा पुढीलप्रमाणे उल्लेख आहे.
       "बाजी पासलकर महायोध्दा, त्याच्या मिशा दंडायेवढया, यांस पीळ घालून वरि केशांच्या आधारे निबें दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला"
चित्रगुप्त बखरीत पुढील प्रमाणे वर्णन आहे
                "पासलकर मोठा योद्धा, ज्याच्या मिशांवर मोठी लिंबे ठेवावी एवढ्या मोठ्या."
चिटणीस बखरीत सुद्धा
      "बाजीराव पासलकर देशमूख मोसेखोरेकर यांस हषमलोक जमाव देऊन महाराजांनी पाठविले." असा उल्लेख आहे.

बखरींमधील उल्लेखावरून बाजी पासलकर यांचे स्वरूप व पद याबद्दल माहिती मिळतेच मात्र १६४२ साली बाजी पासलकर यांना मोगलांनी मोसे बुद्रुक येथे अटकेत ठेवले असल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी बाजी पासलकर मोसे बुद्रुक व तव या ठिकाणी सात भावांसहित राहत होते. यावेळी फितुरीमुळे बाजी मोगलांच्या हाती सापडले व त्यांच्या हाता पायांत बेड्या लावून त्यांना एका वाड्यात अटकेत ठेवण्यात आले होते. 
                    एके दिवशी पहाटेच्या समयी बाजींची कुलदेवता श्री वाघजाई देवी हिने बाजींना दृष्टांत दिला व म्हणाली 'बाजी उठ! हात पाय झटक' हे एकून बाजींनी हात पाय झटकले असता एका हातातील व एका पायातील बेडी अकस्मात तुटून पडली. यानंतर बाजी देवीसोबत पश्चिम दिशेस निघाले, पुढे मौजे पाथरशेत येथे देवी आशीर्वाद देऊन गुप्त झाली.
mavle | फिरंगोजी नरसाळा | Firangoji Narasala | हनुमंत अंगद रघुनाथाला । जेधे बांदल शिवाजीला ।।
   यानंतर घोडदांडा मार्गे बाजी बांबीच्या पाण्यावर गेले या ठिकाणी तोरण माची आहे तिथे यमाजी हळदे यांचा वाडा होता. तेथे यामाजींची सून होती. बाजींचे दाढी मिशा असलेले विक्राळ रूप पाहून ती घाबरली. तेव्हा बाजी तिला म्हणाले की घाबरू नकोस, यामाजीस बोलावं. यमाजी आल्यावर त्यांनी बाजींच्या उरलेल्या दोन बेड्या तोडल्या. यानंतर बाजी आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन धामणहोळ मार्गे कोकणातील कुर्डुगडास गेले व तेथेच त्यांनी बराच काळ वास्तव्य केले. 
           या घटनेत बाजी पासलकरांच्या स्वरूपाचे जे वर्णन आहे ते बखरींतील उल्लेखाशी जुळते आणि बाजी पासलकर यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्यातील कुर्डूगड येथे होते हा उल्लेख बाजी पासलकर यांच्या पोवाड्यातही पुढीलप्रमाणे आहे. हा पोवाडा ज्या ग्रंथात प्रकाशित झाला आहे त्यामध्ये बाजी पासलकर यांच्याविषयी पुढील माहिती मिळते.
               शिवाजी महाराजांच्या अत्यंत प्रितीतल्या बालमित्रांपैकी बाजी पासलकर एक होते. ते आठगावचे देशमुख असून रायगडाखाली छत्री निजामपूरजवळ कुर्डू या नावाचे खेड्यात राहत असत आणि खिंडीचे नाके सांभाळीत. तानाजी मालुसऱ्यांप्रमाणे बाजी पासलकर शिवरायांना अनेक युद्धप्रसंगी उपयोगी पडले होते आणि त्यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या पायदळाचे सरनोबत नेमिले होते. वाडीच्या सावंतांसोबत शिवाजी महाराजांच्या ज्या लढाया झाल्या त्यात महाराजांच्या सैन्याचे मुख्य बाजी पासलकर हे होते व यांच्यामुळे सर्वच युद्धांत महाराजांची सरशी होई. त्यांची एक घोडी होती व ती घेण्यासाठी विजापूरकरांनी खूप खटपटी केल्या होत्या.
बाजी पासलकर यांच्या पोवाड्यात पुढीलप्रमाणे माहिती आहे.
कुर्डूच्या मैदानी नांदे बाजी पासलकर, आठगावचा देसाई त्या बाजीचा धाक थोर।।
दंडा एवढी मिशी बाजी पाच्छाई मजहर।।
   पोवाड्यात उल्लेख असल्याप्रमाणे बाजी पासलकर यांच्याकडे यशवंता घोडी, गजली नावाची फिरंग (धोप) आणि अजगर नावाची ढाल या तीन अप्रतिम गोष्टी होत्या.
     रायगड जिल्ह्याच्या रोहे तालुक्यात अवचितगड नावाचा किल्ला आहे तिथे एक मूर्ती आहे व शिलालेख आहे. ही मूर्ती अवचितगडाचे किल्लेदार बाजी पासलकर यांची आहे असे मानले जाते. अवचितगडावरील शिलालेखात 'बापूजी पासलकर हवालदार' असा उल्लेख आहे. शिवकाळात किल्लेदार ऐवजी हवालदार हा शब्द वापरला जात असे. मराठी रियासतीत बाजींचे मूळ नाव बापूजी असल्याचा उल्लेख आहे. पासलकर वंशातील बाबुराव पाशिलकर यांचा उल्लेखही अवचितगडा संबंधात सापडतो. पासलकर घराण्याचे वंशज अवचितगडाच्या आसमंतात सध्या पाशिलकर या आडनावाने आजही ओळखले जातात.
बाबुराव पासलकर यांचा उल्लेख पुढीलप्रमाणे,
बाबुराव पासलकर, तालुके अवचितगड, याणीं सरसुभाकडील लोक घेऊन किल्यास वेढे देऊन, रसद बंद केली. ते किल्ले बी तपशील.
  बाजी पासलकरांचे पुरंदरचे युध्द :-
     छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरवात केली. तोरणा, सुभानमंगळ असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
    फत्तेखानाने जेजुरीजवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करुन किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखान वर हल्ला करण्यासाठी बाजी पालसकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले, अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला.
   फात्तेखांचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला, पुरंदराला खानच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गानिमांची कत्तल केली. फात्तेखांचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वीराने मुसेखानाच्या छाताडाचा वेद घेतला व खान कोसळला. 

      मुसेखानाच्या पराभवाने सगळं आदिलशाही सैन्य माघारी फिरले. मराठ्यांनी त्यांचा पाठलाग केला, बेलसरच्या छावणीपर्यंत मराठे घुसले नेतृत्व करत होते बाजी पासलकर! "एकही शत्रू सोडू नका, मावळात घुसलेला दुश्मन परत जात नाही हे कळू द्या सगळ्यांना!" असे गर्जत त्वेषाने बाजी आदिलशाही सैन्याच्या गोटात घुसले, सपासप एक एक करत गनिम कापत बाजी आत घुसले. ६५ वर्षाच्या या तरुणाचे शौर्य बघत इतर तरुण मावळे पण कापाकापी करायला लागेल. मोघल पळत होते आणि मराठे पाठलाग करत होते.
    घात झाला, बाजी लढताना एक घाव त्याच्या समशेरधारी हाताच्या दंडावर झाला, त्याही घावाला सावरत बाजी मागे वळाले आणि काही कळायच्या आत गनिमाने बाजींच्या छातीवर वार केला. ६५ वर्षाचे तरुण बाजी कोसळले. आपला सरसेनापती जखमी झाला हे पाहून मावळे आणखी द्वेषाने पेटून उठले, त्यांनी हजारो गनिम कापून काढले.
   बाजी पडल्याचे कळताच त्यांचे नातू बाजी जेधे यांनी बाजींना यशवंती घोडीवर चढवले मागे असलेले कावजी मल्हार देखील बाजींच्या सोबत होते. त्या यशवंतिला आणि कावजीना देखील या वीरांचे शौर्य जाणवत होते. घोडयावर पटकन टाप टाकून शत्रूला कापणारे बाजी जखमी शरीराने यशवंतीच्या पाठीवर होते, त्या यशवंतीच्या देखील डोळ्यातून अश्रू ओघळत असतील ओ....
    राजे गडावर बाजी पासलकर, कावजी मल्हार, बाजी जेधे आणि इतरांच्या पराक्रमाचा गौरव करण्याच्या तयारीत होते, परंतु गडावर विजयाचा निरोप घेऊन आलेल्या कावजींच्या चेहऱ्यावर स्वराज्याच्या पहिल्या विजयाचे हास्य नव्हते. महाराज बाहेर आले, त्यांनी जखमी बाजींना बघितले आणि ते अश्रूंना आवर घालत बाजींपाशी गेले व बाजींना जवळ मांडीवर डोकं ठेवत म्हणाले वैद्यांना बोलवा कोणी तरी. बाजींना माहीत होतं ते आता काही क्षणाचेच सोबती होते! बाजींना मुलगा नव्हता, बाजींना महाराजांच्या रूपाने लेकाची मांडी लाभली, काय ते थोर भाग्य!
   वीर पराक्रमी बाजी स्वराज्यासाठी धारातीर्थी पडणारे पहिले मावळे! स्वराज्याचा पहिला सरसेनापती राजांना आणि स्वराज्याला सोडून गेला. प्रतिपदेचा हा स्वराज्याचा विजय पौर्णिमेच्या चंद्राला देखील लाजवणारा होता पण यात हरवलेली चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळायची नाही! बाजींच्या धारातीर्थाने इतरही मावळ्यांमध्ये स्वराज्यासाठी सर्वस्व झोकून देण्याची भावना निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी मरणारे शूर मावळे या स्वराज्याला लाभले.
    बाजींची समाधी आज सासवड जवळ कुंभारवाडा येथे आपल्याला बघायला मिळते.बाजींना वंशपरंपरागत यशवंतराव ही पदवी होती, त्यामुळे या समाधीला यशवंतबाबांची समाधी म्हणून ओळखले जाते. पुण्याजवळील वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजी पासलकरांचे नाव देऊन गौरवण्यात आले. बाजी पासलकरांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोड वर आहे. या सर्व समाधी व स्मृतीस्थळांना आयुष्यात एकदा नक्की भेट दिलीच पाहिजे.
    ८ ऑगस्ट १६४८ ही तारीख बाजी प्रभूंच्या स्मृतीदिन म्हणून समजली जाते आणि याच दिवशी बाजींची पुण्यतिथी साजरी केली जाते. काही ठिकाणी हीच तारिख २४ मे १६४८ सांगितली आहे.

पुढे महाराजांनी बाजींच्या कुटुंबाचे सांत्वन स्वतः जाऊन केले. पासलकर घराण्याने इतिहासात अनेक अजरामर कार्य केले त्यात सवाई बाजी पासलकर असतील किंवा बाजींचे जावई कान्होजी आणि नातू बाजी असतील, बाजींचे बंधू असतील किंवा संभाजी राजांच्या मृत्यूवेळी औरंग्याला थांबवून धरणारे पासलकर बंधू असतील, या सर्वांनी स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली!







बाजींची समाधी आज सासवड जवळ कुंभारवाडा येथे आपल्याला बघायला मिळते.बाजींना वंशपरंपरागत यशवंतराव ही पदवी होती, त्यामुळे या समाधीला यशवंतबाबांची समाधी म्हणून ओळखले जाते. पुण्याजवळील वरसगाव धरणाच्या जलाशयाला बाजी पासलकरांचे नाव देऊन गौरवण्यात आले. बाजी पासलकरांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोड वर आहे.  बेलसर गावात बाजींचे स्मृतीस्थळ आहे. अशा या वीर सरसेनापती बाजी पासलकरांच्या चरणी मानाचे वंदन!  या सर्व समाधी व स्मृतीस्थळांना आयुष्यात एकदा नक्की भेट दिलीच पाहिजे.   


    शिवरायांचे एकनिष्ठ सहकारी असलेल्या बाजी पासलकर व पासलकर घराण्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे, इतिहासात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या या घराण्याविषयी आणखी माहिती उजेडात आणणे हे त्यांच्या स्वराज्यकार्यास न्याय दिल्यासारखे होईल.
   यदुनाथ सरकारांच्या मते काय सावंताच्या युद्धात बाजी मरण पावले (हे सवाई बाजी असावेत). सभासदाच्या बखरीत या युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. राज्पुरीहून काय सावंत म्हणोन पांच हजार फौजेनिशी युद्धास आला. युद्ध मोठे होतां बहुत रणखंदल जाले. काय सावंत खास व बाजी पासलकर महायोद्धा, याच्या मिश्या दंडायेवढ्या, यांस पीळ घालून वारी केशांच्या आधारे निंबे दोहींकडे दोन ठेवीत होता, असा शुरमर्द ठेविला, याशी व त्याशी खासाखाशी गांठ पडली. एकास एकांनी पंचवीस जखमा करून ठार मारले. मग उभायान्ताकडील दळ आपले जागीयास गेले.
    बाजी पासाल्कारांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. पुण्याजवळील वरसगाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे.


जगताप घराणे 
भारतात सध्याचा राजस्थान, गुजरात आणि मध्यप्रदेश या भागात रजपूत राजे हे 8 व्या शतकापासून राज्य करत होते. "हरजी दादाजी जगताप "हे जगताप घराण्याचे मूळ पुरुष असून ते उत्तरेतून भरतपूर मधून दक्षिणेकडे आले असावेत . राजपूत असलेल्या या घराण्याचे मूळ नाव तुवर असे होते . जगताप घराण्याचे वंश आणि" तुवर" या घराण्याचा वंश एक असून गोत्र अत्रि .गादी भरतपूर ,निशाण ढवळे, देवक उंबर आहे . राजा "अंगनपाळ" याने इ. स. ७३६ मध्ये दिल्ली स्थापन केली 'विग्रहराज्या" याने अंगनंपाळ याचा पराभव केला व दिल्ली काबीज केली. दिल्लीच्या भागात तोमर किंवा आपण त्यांना तुंवर म्हणून ओळखतो ते राजे राज्य करत होते. पृथ्वीराज चौहान देखील दिल्लीच्या राजकारणातील एक महत्वाचे नाव होते. पुढे जाऊन सुलतान शाहीला दिल्लीच्या तख्तावर सुरुवात झाली मात्र तरी देखील हे रजपूत राजे निष्ठेने लढत होते. सुलतानी शक्ती समोर त्यांची ताकद कमी पडत होती. त्यापैकी एक रजपूत राजाने म्हणजे भरतपुरच्या वसुसैन राजाच्या वंशातील दोन पराक्रमी बंधूनी भरतपुरच्या सुलतानी अधिकाऱ्याचा जुलूम बघूज त्याला ठार मारले. हा पराक्रम करून ते महाराष्ट्रात दाखल झाले. .ग्वाल्हेर ,भरतपूर इतरत्र हा राजवंश पांगला असावा असे वाटते" मान सिंग" (१४८६-१५१७)हा नावाजलेला राजा ग्वाल्हेर जवळील प्रांतात होऊन गेला . हरजी राजे फलटणजवळील झणझणे येथे सन १३३० मध्ये पाटीलकी करत असल्याचा पुरावा कागदोपत्री मिळाला आहे .महाराष्ट्रात आलेले हे दोन्ही बंधू सासवड भागात आणि पंदारे या बारामती जवळील भागात स्थिरावले. पंदारे भागातील भावाला पुढे मुरुंब खोऱ्याची देशमुखी मिळाली. सासवड भागातील जे घराणे स्थिरावले त्या घराण्याचा गोदाजी यांच्याशी संबंध आहे.
जगताप घराण्याची वैशिष्ट्य :-
१)  या घराण्याचे मुळपुरुष सोमवंशी राजा वसुषेण असून त्यांना चांद्रवंश सोमवंश आहे.
२) हे घराणे मुळ राजस्थानातील भरतपुरचे मानले जाते.
३) घराण्याचे राजचिन्ह घोडा असून निशाण भगवा ध्वज आहे.
४) खंडेराव भैरवनाथ हे कुलदैवत असून जोगेश्वरी ( सोनोरी आणि लोणी भापकर येथील ) हि कुलदेवता आहे.
५) देवक उंबर, पिप्पळ, कंदब आणि वड वृक्ष
६) दालभ्य ऋषी हे गुरु असून गायत्री मंत्र हा घराण्याचा मंत्र आहे.
७) इतर ( जोड ) आडनावे :- आवळे, आमरे, इथापे, कबरे, काटेधर, काशिंदे, कोंडे, कोरकर, खंबीर, खांबरकर, गाडेकर, चपराखे, जकाते, जगजाहीर, जगदीश, जगमित्र, झांगडे, ढाले, ढिसाळ, तामस, दिसरात, दुख, दुर्जर, डोंबे, डोंगरवाटे, दुबळे, देवब्डले, धोलप, नागड, निम्से, पठाण, पाठर, पाडेकर, पाडघरे, पाडे, पाडवे, बावळे, वारहाते, येवले, रणसिंग, बाईड, वाळूंज, बयाले, वाझे, विसाळे, सांगे, साबणे, साभरे, सागोळे, सुरकर, ढेन्डे, नावे, नवलाखे, नागशुळे, बाली, बहातरे, शामकर्ण, हेंबडे, खेनात, शिंदोरे
जगताप घराण्याच्या शाखा :-

जगताप घराण्यातील महत्वाचे वीर :-


जगताप घराण्याचे राजचिन्ह
जगताप घराण्याचे राजध्वज

. याच शतकात म्हणजे सन १३३० मध्ये हरजी जगताप कऱ्हे काठावरील सरडी या गावी आले .येथे महादजी येसाजी कुटे पाटीलकी करीत होता. हरजी बरोबर एक व्यक्तीही आला होता तो' चौरे "घराण्याचा मूळ मुरुष होता त्याची समाधी सासवड येथील वटेश्वर मंदिराच्या पाठीमागे आहे
. हरजीनी कुटे कडून पाटीलकी खरेदी केली .तशेच' दाणे पिंपळगाव" (टाकमाईचे देवस्थान) येथील पाटीलकी मिळवली.
अशा रीतीने वरखेड ,सरडी , सदत,संवत्सर, दाणे पिंपळगाव, सनवडी या सहा वाड्या एकत्र करून त्यांनी सासवड वसवले . हरजी जगताप सिद्धेश्वर जवळच राहत होते . ते मयत झाल्यावर त्यांची समाधी सर्व्हे ४९९ येथे बोरीच्या पटात बांधण्यात आले.
. . हरजी याना दोन मुले होती . हेमंत व नेमत ! तेही कर्ते मनुष्य निघाले असे दिसून येते . काही कागद पत्रातून असे दिसून येते." राजे मजकूर (हरजी राजे )यांचे पुत्र हेमंत नेमत जमीसदार कर्ते माणूस निघाले. त्यांचा मनसुबा गावची वस्ती वाढवावी सत्यावरून रुद्राजी,राघोजी,व काळोजी घराणे सध्याचे (वडसकर) वतनदार सहा गावचे रुद्राजी कर्ता भाऊपणा करून घेतला .करणे वडाखेलकर गुरव घराणे निम्मे पाटीलकी वडाखेलची आपल्यापाशी गहाण ठेऊन सदोसजी शिवाजी पटल्यास १०५ दिले व पाटीलकी अनुभवत होते. सहा गावचे साधन करून घेतले शिवार साधनात आणला .
" हेमंत यास मुलबाळ ना झाल्याने त्याचा वंश वाढला नाही . नेमत यास नरस पाटील व कान्हू पाटील हे वारसदार पुत्र झाले यादोघांनी शके १३२२ म्हणजेच सन १४०० मध्ये जमिनीचे नामकरण करून सासवड केलेले पाटीलकी करू लागले .
नरस पाटील पुन्हा आपल्या जुन्या गावी "झणझणे सासवड" या फलटण जवळील गावात निघून गेला. कान्हू पाटील याचे पुत्र माऊजी व रामजी पाटील हे होत . सन १४९६मध्ये सासवड गाव मौजे होता तो कसबा झाला .
    कान्हू पाटलाचे रामजी पाटील यास बिदर च्या बादशहाने १२ गावची देशमुखी शिक्का करून दिला. त्यात पुणे गावची ४ गावे ,शिरवळ गावची ४ गावे ,सुपे गावची ४ गावे होती. मौजी नाईक जगताप यास खळद बेलसर,दिवे.मोढवे,राखुर्डी बांबूर्डी कारखेक कोरळी ,कोडीत बुद्रुक या ९ गावाची देशमुख राहिले. माऊजी पाटलांच्या फिरंगोजी या मुलास शंकराजी व मालजी असे दोन पुत्र होते
मालजीस अनाजी , गोदाजी ,राहुजी असे तीन मुलगे होते यापैकी गोदाजी जगताप हे शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार होते त्यांच्याकडे १०००० फौजेची मनसबदारी होती .
गोदाजी जगताप यांचे सक्खे पुतणे राहुजी आणि खंडोजी हेही चुलत्या प्रमाणे १०००० फौजेची मनसबदारी असलेले सरदार होते पेशवाई मध्ये चमकलेले दिसतात .
माऊजी जगताप आणि रामजी नाईक जगताप यांच्या कालखंडात" एकनाथ "महाराजांचे परमशिष्य" नारायण गोसावी" हेसोपान महाराजांची सेवा करीत होते . त्यांना अलंकापुरीस मौजी बंधनासाठी मदत करावी म्हणून तळेगाव (ढमढेरे )येथील खंडोजी आणि रामजी पाटील याना पत्रातून लिहिले कि " स्थल विचारता तुमच्या सारखे नाईक सोडून कोणास न्ह्यावे .एकतरी कुलवंत जगताप राव तुमचा नामोस जैसा आमचा तसाच आहे . दुसरे आम्हाहुन तुम्ही सोपानदेवांची भक्तराज आहेत आणि महद पुण्यधिकारी आहात आप्त जाणवून तुम्हास हि विनंती लिहिले असे तीस रुपयांची भरती पाहिजे विनंती उदास न केली पाहिजे "
     या पत्रावरून जगताप घराणे हे प्रमुख नामवंत घराणे हे प्रमुख नामवंत घराणे असे म्हणता येईल . बेलसरच्या लढाईत सासवडच्या पश्चिमेस असलेल्या पंढरीच्या ओढ्यात मुसलमानांशी लढताना धारातीर्थी पडलेले" सरदार नंदाजी जगताप हे नरस पाटील यांच्या वंशातील होते .
पहिल्या महायुद्धात पराक्रम करून जंगी इनाम मिळवणारे" नारायणराव सोपानराव जगताप ,"सुभेदार मेजर आसि . लेफ्ट ." गुलाबराव लक्ष्मणराव जगताप "सासवड नगरपालिकेचे भूतपूर्व नगराध्यक्ष" भाऊशेठ जगताप ",माधवराव पंढरीनाथ जगताप या कर्तबगार व्यक्ती"सरदार नंदाजी जगताप' यांचे वंशज होते .
कान्हू पाटीलदेशमुख यांचे वंशज "राधाकृष्ण खंडेराव जगताप देशमुख " "शंकरराव भगवंतराव देशमुख" (सुभेदार मेजर ) "सुभानराव देशमुख इत्यादी त्यांचे वंशज होते
".सरदार गोदाजी जगताप" यांचे वंशज "नानासाहेब नारायणराव जगताप होते." शंकरराव पांडुरंगजी जगताप" हे सरदार" खंडोजी जगताप "यांचे वंशज होते .
" सीताराम पाटील" हे" सरदार खंडोजींचे" सक्खे बंधू" आप्पाजी "यांच्या वंशातील होते
"भिकोबा नारायणराव जगता"प हे "शंकराजी यांचा मुलगा मानाजी" यांच्या वंशातील होते.
सासवड मधील सर्वात जुने घराणे म्हणून जगताप घराण्याचा उल्लेख करावा लागेल." जगताप" यांचे शिवकाळातील व पेशवाईतील क्षात्रतेज आजच्या पिढीला व सासवडच्या भूमीला निश्चितच भूषणावह आहे .यात कोणाचेही दुमत नसावे . या घराण्याने स्वराज्याच्या सुरवातीपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक शूरांची आहुती दिलेली आहे . पुढील पिढीला त्यांचा उज्वल इतिहास नक्कीच प्रेरणादायी ,स्फुर्तीदायी आहे .
गोदाजी जगताप
मुसेखानाचा कर्दनकाळ : श्रीमंत सरदार गोदाजीराव जगताप 
     शिवकाळात या घराण्यातील गोदाजी जगताप हे नाव प्रचंड पराक्रमाचा इतिहास घेऊन उभे आहे मात्र आपल्याला निवडक मावळे सोडता इतरांविषयी जास्त माहिती नसते. बहिर्जी हे गोदाजी जगताप यांच्या वडिलांचे नाव होते. शिवकाळात जगताप घराण्याकडे या सासवड भागातील १० गावांची देशमुखी होती. जगताप घराण्याकडे सासवड, दिवे, कोढीत बुद्रुक, खळद, बेलसर, राख, मोढवे, बाबुर्डी, कारखेळ, कोळोली ही गावे देशमुखी करता होती. 
इ.स. १६४५ हा काळ मध्ये रायरेश्वर महाराजांनी शपथ घेतली तेव्हा महाराजांच्या समवेत कदाचित गोदाजी जगताप देखील असावेत असा अंदाज आहे. तोरणा जिंकून महाराजांनी स्वराजाच्या स्थापनेला सुरुवात केली. पाठोपाठ राजगड देखील ताब्यात आला. कोरीगड देखील स्वराज्यात आला होता. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरूवात केली.शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती.जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक-एक किल्ला काबीज करावयास सुरूवात केली.
सर्व काही सुरळीत चालू होते मात्र मार्च १६४८ रोजी महाराजांनी सिंहगडावर हल्ला करून काबीज केला आणि त्यासोबत शिरवळ या आदिलशाही ठाण्यातील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला केला. विजापुरच्या अदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या.आता आदिलशहाला याचा धक्का बसला. तो संतप्त झाला आणि त्याने शिवरायांवर दबाव आणण्यासाठी शहाजी राजांना जिंजीला कैद केले. महाराजांवर म्हणजेच स्वराज्यावर चाल करुज फत्तेखानाला मोठ्या फौजेनिशी पाठविले. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी अदिलशाहने सन १६४८ साली फत्तेखानास धाडले.
   फत्तेखान स्वराज्यावर चालून आला. त्याने बेलसर येथे ठाणे मांडले. महाराजांनी घेतलेलं शिरवळ ठाणे बाळाजी हैबतराव या आदिलशाही सरदाराने काबीज केले. महाराजांनी फत्तेखानाला शह देण्यासाठी युक्ती सुरू केली. महाराजांनी पुरंदर या स्वराज्याच्या तेव्हाच्या सीमेवरील किल्ल्याची निवड केली. आदिलशाही सरदार निलकंठराव यांच्याशी मतभेद घालून किंवा बोलणी करून महाराजांनी हा किल्ला मिळविल्याचा उल्लेख आढळतो. 
   पुरंदर किल्ल्यावरून आता सर्व सूत्र हालत होती. शिरवळ घेण्यासाठी कावजी मल्हार खासनिस या मराठा वीराची तुकडी पाठविण्यात आली. तुकडीत गोदाजीराव देखील होतेच. वीरांच्या या तुकडीने पुरंदर ते शिरवळ असा प्रवास करत शिरवळ कोटाला पाडले. बाळाजी हैबतराव या आदिलशाही सरदाराची हत्या कावजी मल्हार यांनी केली. शिरवळ कोटाला रक्षणासाठी एक तुकडी तिथे ठेऊन कावजी व गोदाजी पुन्हा पुरंदरावर आले.
    महाराजांनी बाजींच्या नेतृत्वात एक तुकडी फत्तेखानाच्या बेलसर छावणीवर पाठविली. बाजींना यात वीरमरण आले मात्र यांची युक्ती वेगळीच होती. सैन्यावर हल्ला झाल्यानंतर पुन्हा ही तुकडी माघार घेत असे. फत्तेखानाच्या सैन्याला पाठीवर घेत घेत हे सैन्य पुरंदर किल्ल्याच्या परिसरात आणण्याचे काम मावळ्यांच्या या तुकडीने केले. पुरंदर वर ही सर्व सैन्याची तुकडी परत आली. 
    फत्तेखानचे सैन्य देखील पुरंदरला वेढा घालून बसले होते. पुरंदर घेण्यासाठी हे प्रयत्न सुरू होते. फत्तेखानचे सैन्य पुरंदरच्या तटावर चढत होते. मराठा सैन्याने त्यांना काही टप्प्यावर येऊ दिले. एकदा कठीण चढण सुरू झाल्यानंतर मात्र मराठ्यांनी दगड लोटून, गोफणीने दगड भिरकावून फत्तेखानाच्या सैन्याचा पाडाव करायला सुरुवात केली. एका टप्प्यात सैनिक आले की महाराज नव्या दमाची तुकडी या सैन्यावर आक्रमणासाठी बालेकिल्ल्यावरून आणि पुरंदर माची वरून पाठवत असत. मुसेखान हे एक फत्तेखानाच्या सोबत असलेल्या सरदाराचे नाव होते. याच्या सोबत अनेक आघाडीचे सरदार होते मात्र यावर गोदाजी आणि त्यांच्या सोबतीला इतर काही मावळे चालून गेले. फौजेचे सरदार ओळखून या मावळ्यांनी त्यांना घेरले. गोदाजींनी मुसेखान सरदार घेतला. गोदाजी रावांनी आपल्या हातातील भाला मुसेखानाच्या छातीत घातला. गोदाजीरावांनी हा पराक्रम केला मात्र मुसेखान पठाण असल्याने त्याला याचा जास्त प्रभाव पडला नाही. मुसेखानासोबत असलेल्या इतर पठाणांनी गोदाजीरावांवर चाल केली. अनेक पठाणांनी गोडजीराव घेरले गेले. तरी देखील त्यांची समशेर थांबली नाही. असंख्य पठाणांना कापत गोदाजीराव पुढे चालत होते. मुसेखानाने संधी साधत गोदाजींच्या मस्तकावर वार करण्यासाठी तलवार उगारली मात्र गोदाजींनी अगदी चपळता दाखवत त्याचा वार होण्याची आधी मुसेखानाचे दोन तुकडे केले. वार मोठा झाला होता. खांद्यावर लागलेली गोदाजींची तलवार मुसेखानाच्या पोटापर्यंत जात त्याला दोन तुकड्यांमध्ये विभागत होती. आदिलशाही सैन्याने हे बघितले. आपला आघाडीचा सरदार पडल्याने त्यांचे मनोबल खचले. त्याच प्रमाणे मराठ्यांमध्ये अधिक उत्साह आला आणि त्यांनी अधिक प्रखरपने आदिलशाही सैन्यावर हल्ला चढविला. 
    फत्तेखान गडबडला आणि त्याने सैन्यासोबत आदिलशाही ठाण्याकडे म्हणजेच विजापूरकडे धाव घेतला. गोदाजी जगताप, भैरोजी चोर , भिमाजी वाघ यांचा हा पराक्रम स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या सरदाराचा पहिला पराभव करण्यासाठी कारणीभूत ठरला.
    मराठ्यांचा हा विजय स्वराज्यासाठी अधिक प्रेरणादायी आणि आदिलशाही साठी एक सर्वात जास्त मोठा धक्का ठरला. महाराजांनी यानंतर जावळीवर विजय मिळविला, शाहिस्तेखानाला पळवून लावलं, अफजलखानाचा वध केला आणि इतरही स्वराज्य कार्यात गोदाजी यांचे योगदान हे सतत होते. महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सेवेत देखील गोदाजीराव जगताप यांचे नाव होते. विठुरायाच्या पंढरीला जाणारी वारी ही दिवे घाटातून जाते. या वारीच्या संरक्षणाची जबाबदारी महाराजांनी गोदाजी राव आणि देशमुखी असलेल्या जगताप घराण्याकडे सोपवलेली होती. 
  प्रतापगडाची लढाई १० नोव्हेंबर १६५९ ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. प्रतापगडावर च्या लढाईत देखील गोदाजी जगताप यांनी खानाचे असंख्य सैन्य कापून काढले.
यानंतर आदिलशहाचा सरदार रुस्तुमे खान हा १६५९ मध्ये दहा हजाराची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला यावेळी छत्रपती शिवाजी राजे सेनापती नेताजी पालकर यांच्या सोबत गोदाजी यांनी देखील पराक्रम केला.या लढाईत खानाचा पराभव झाला. पुढे १६७१ रोजी मोंगलांनी साल्हेर किल्ल्यावर आक्रमण केले. यावेळी साल्हेर वाचवण्यासाठी अनेक मराठा सरदारांनी पराक्रमाची शर्थ केली. या लढाईत गोदाजी जगताप यांच्या सोबत त्यांचे बंधू संताजी व खंडोजी देखील होते. जगताप बंधूनी या लढाईत पराक्रमाची शर्थ केली.
औरंगजेब ने १६८९ साली छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश ह्यांना औरंगजेबाने तुळापुर येथे हत्या केली. आता औरंगजेबाची पापी नजर फिरली ती रायगडाच्या दिशेने. त्याने रायगडा भोवतीचे फासे आवळण्यास सुरुवात केली. औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. ह्याच वेळी संपूर्ण राज घराणे येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले.
हीच संधी, सुवर्ण संधी ठरवण्याच्या हेतूने औरंगजेबाने शहाबुद्धीन खानाला जुल्फिकार खानच्या मदतीस धाडले. स्वराज्यावर धावून येणारे संकट पाहून माणकोजी पांढरे सारखे कर्मदरिद्री मराठे मोघलाना शामिल झाले. आई जगदंबा मदतीस धावून आली.
मोघलांचा व कपटी देशद्रोह्यांचा काळा डाव हेरखात्याने हेरला व तत्काळ रायगडच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावातील जिवाजी नाईक सर्कले व गोदाजी जगताप ह्या दोन सरदारांना सांगितला. स्वराज्यावर चालून येणारे संकट आणि त्याचे परीणाम लक्षात घेत हे दोन्ही वीर सोबत असलेले ९ मावळे घेऊन मोगलांना रोखण्यास सज्ज झाले. वाऱ्याच्या वेगाने व सिंहाच्या छातीने सारे वीर खिंडीच्या दिशेने धावु लागले व बघता बघता खिंडीच्या तोंडाशी येऊन ठाकले. प्रत्येकाने आपल्या आपल्या हल्ल्याच्या जागा हेरल्या.
मराठमोळ्या गोफणी शत्रू सैन्यावर बरसण्यास तैयार झाल्या. आकाशातून जसा उल्कापात व्हावा तसा मराठ्यांचा गोफणी आता आग ओकत होत्या. भेटेल त्याला, भेटेल तेसे, कपात, तुडवत मराठे वीर पुढे सरकू लागले. अंगावर झालेल्या जखमा जमिनीवर रक्ताभिशेख करत होत्या. मणभर मोगली फौजे पुढे कणभर मराठे पुरून उरले.
काही मराठे वीर खिंडीत कमी आले. शेंदूर फासलेल्या हनुमंता सारखे सारे वीर दिसू लागले. ' रणचंडिका प्रसन्न झाली. ' मराठ्यांचा तो आवेश पाहून मोघली सैन्य माघार घेऊन पळू लागले. पराक्रमाची शर्थे झाली. मोघलांच्या वाढीव तुकड्या जुल्फिकार खानाच्या फौजेला मिळण्यात असमर्थ झाल्या. मोघलांचा हा डाव गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक तसेच त्या नऊ योध्यांनी हाणून पडला आणि इतिहासात अजरामर झाले.
जर या लढाईत गोदाजी जगताप व जीवाजी नाईक यांनी खिंड रोखून धरली नसती तर इतिहास वेगळाच घडला असता. कदाचित महाराणी येसूबाई व संभाजी पुत्र शाहू राजेंबरोबरच छत्रपती राजाराम व महाराणी ताराबाई हे दोघेही मोंगलांच्या कैदेत गेले असते व मराठ्यांचे स्वराज्य १६८९ रोजीच नष्ट झाले असते. यावेळी स्वराज्य वाचवण्याचे महत्वाचे कार्य गोदाजी जगताप यांनी केले.
     याच्या नंतर मात्र गोदाजी जगताप यांचा इतिहासात उल्लेख सापडत नाही. गोदाजी रावांच्या पराक्रमाला साजेसा असा त्यांचा शेवटचा इतिहास उपलब्ध नाही याची खंत वाटते. यापुढे कधी गोदाजीराव यांचे नाव इतिहासात आले नाही मात्र वयाचा अंदाज घेता कदाचित त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला असावा असा अंदाज बांधता येतो.  त्यांचा मृत्यू कधी झाला याची देखील नोंद इतिहासात सापडत नाही. अशा या वीर सरदाराची समाधी सासवड येथे संगमेश्वर मंदिराजवळ आहे. सासवड शहरातील संगमेश्वर मंदिराच्या उत्तरेस पुर्वाभिमुख हि घुमटी आहे. हि सरदार गोदाजी जगताप यांची समाधी. समाधी ची अवस्था फार बिकट असून बरचसे बांधकाम काळाच्या ओघात कोसळले आहे.
गोदाजी जगताप समाधी स्थळ
  सासवड येथे गोदाजीराव जगताप यांची समाधी आहे. सासवड मधील पुणे बारामती मार्गावरील मुख्य चौकाच्या जवळ कऱ्हा नदी आहे. या नदीकाठी संगमेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या पुलावरून पलीकडे गेले की आपल्याला डाव्या हाताला गोदाजीरावांची समाधी दिसते. 
गोदाजी जगताप समाधी स्थळ
हरजीराजे जगताप समाधीस्थळ

समाधी मंदिरात आपल्याला गोदाजीराव यांचा फोटो बघायला मिळेल. इथे नित्य पूजा देखील होत असते. 

जगताप घराण्यातील नंदाजीराव जगताप या वीराची समाधी पांढरीच्या ओढ्यात आहे. नंदाजीराव यांना पुरंदरच्या युद्धात वीरमरण आले होते. मात्र ही समाधी त्यांची आहे का? याविषयी मात्र अजून काही माहिती नाही त्यामुळे आपण सध्या तरी या समाधीला नंदाजीराव यांची संभाव्य समाधी म्हणूनच समजूया. 

सासवड येथे युद्धप्रसंगाचा आवेश असलेला गोदाजीरावांची पुतळा देखील या मंडळींनी उभारला आहे.

पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे स्मारक :-

छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य नामशेष करण्याची औरंगजेबाची इच्छा शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही. औरंगजेबाच्या मृत्युनंतर  सम्राट बनलेल्या आझमशहाने १८ में १७०७ ला छ. शाहुंची मोगलांच्या कैदेतुन सुटका केली. जेंव्हा छ. शाहु महाराष्ट्रात आले तेंव्हा त्यांना अनेक प्रतिष्ठित सरदार येऊन मिळाले. परंतु या सर्वांमध्ये  छ. शाहुंना बहुमोल मदत झाली ती बाळाजी विश्वनाथ भट या कर्तबगार पेशव्याची ! (सु. १६६० ? – २ एप्रिल १७२०). भट घराण्यातील पहिला पेशवा. त्याने पेशवेपदाचे महत्त्व वाढविले व ते पुढे त्याच्या वंशजांकडे गेले; या अर्थाने बाळाजीस पेशवाईचा संस्थापक म्हटले जाते. 
पेशवा बाळाजी विश्वनाथ विषयी माहिती 2021 | Full Peshwa Balaji Vishwanath Information In Marathi

भट घराणे श्रीवर्धन मधील प्रतिष्ठित घराणे. जे पुढे स्वराज्याचे पेशवे म्हणून नावारूपाला आले.

या घराण्यातील पहिल्या पुरुषाचा उल्लेख महादजीपंत भट या नावाने मिळतो. जे दंडा-राजपुरी येथील देशमुखी सांभाळत होते.

  • महादजीपंत भट - एकूण मुले दोन. = १. परशुराम पंत २. नारोपंत.
  • परशुराम पंत - एकूण मुले दोन. = १. विश्वनाथ २. कृष्णाजी.
  • विश्वनाथ परशुराम भट -एकूण मुले पाच .= १.कृष्णाजी. २. जनार्दन. ३. रुद्रजी ४. बाळाजी(बालाजी विश्वनाथ भट) ५.विठ्ठल.
  • बाळाजी विश्वनाथ भट (भट घराण्यातील पाहिले पेशवे) - पत्नी - राधा बर्वे एकूण मुले सहा. औरस = १. थोरले बाजीराव. २. चिमणाजी (इतर नावे - अनंत, चिमजीआप्पा) ३. भिऊबाई. ४. अनुबाई. अनौरस = १. राणोजी शिंदे. २. भिकाजी शिंदे.
  • बाजीराव बल्लाळ भट. मूळ नाव - विश्वनाथ, विश्वासराव. - पत्नी - काशीबाई जोशी - एकूण मुले सहा. औरस = १. नानासाहेब २. रामचंद्र(बालमृत्यू) ३. मुलगा(बालमृत्यू) ४. रघुनाथराव ५.जनार्दन. अनौरस = १. समशेर बहादूर(कृष्णराव - मस्तानीबाई)
  • नानासाहेब बाजीराव भट . मूळ नाव - बल्लाळ, बाळाजी. - पत्नी - गोपिका रास्ते, राधा वखारे. एकूण मुले पाच. १.विश्वासराव २. माधवराव. ३. यशवंत(बालमृत्यू) ४.मोरेश्वर(बालमृत्यू) ५.नारायणराव.
  • माधवराव बाळाजी भट. - पत्नी - रमाबाई जोशी. - संतती नाही.
  • नारायणराव बाळाजी भट - पत्नी - गंगाबाई एकूण मुलं एक. १. माधवराव.(सवाई)
  • रघुनाथराव बाजीराव भट - पत्नी - आनंदी ओक. एकूण मुले सहा. १. भास्कर. २. विनायक ३. दुर्गाबाई ४. बाजीराव. ५.चिमणाजी. दत्तक - १. अमृतराव
  • सवाई माधवराव नारायणराव भट - पत्नी यशोदा गोखले. संतती नाही.
  • बाजीराव रघुनाथ पेशवे - पत्नी- सरस्वतीबाई. औरस संतती नाही

रघुनाथरावांच्या दत्तक पुत्राचे, अमृतरावाचे वंशज डॉ. उदयसिंग पेशवा पुण्यात राहतात. आणि समशेर बहादूर यांचे वंशज बांदा येथे राहतात.

पेशवा बाळाजी विश्वनाथचे पूर्ववृत्त :
      बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म कोकणात श्रीवर्धन या ठिकाणी इ.स.१६६० ला झाला.महादजी विसाजी भट म्हणजे बाळाजींचे पणजोबा. सन १५७५ महादजीपंत भट श्रीवर्धनचे देशमुख झाले, त्यांच्याकडे श्रीवर्धन व दंडाराजपुरी परिसराची देशमुखी होती. पुढे बाळाजींचे आजोबा व वडील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाकरीत होते असा कयास इतिहासकारांनी मांडला आहे. (सन १६६० परशुरामपंत भट शिवाजीमहाराजांच्या कारकुनी सेवेत दाखल झाले, ) “वाका श्रीमंत कैलासवासी सिवाजी छत्रपती माहाराज त्यांचे जवल श्रीमंत कैलासवासी परशरामपंत उपनाव भट कसबे श्रीवर्धन तो॥ म॥र प्रां॥ (तालुके मजकूर प्रांत) दंडाराजपुरी येथील देशमुख हे चाकरीस राहीले. तो प्रकार सदरी लिहीला आहे. त्यांचे चिरंजीव कैलासवासी विसाजीपंत यांस दोन हजारी फौजेची सरदारी सांगितली”. या विश्वनाथ परशुरामा उर्फ शिवाजी यांना कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी आणि विठ्ठल असे पाच पुत्र होते. वयाच्या १०-१२ व्या वर्षी त्यांचा बर्वे घराण्यातील राधाबाईंशी विवाह झाला. भट घराण्याकडे श्रीवर्धन आणि वेळासे या दोन गावांची सरदेशमुखी होती. परंतु हा प्रदेश जंजिऱ्याच्या सिद्दीच्या ताब्यात होता. काही कारणाने सिद्दी आणि बाळाजी यांच्यात पटेनासे झाले.कोकणातील महाल दंडा राजपुरी आणि श्रीवर्धन येथील देशमुखीचे वतन या घराण्यात चालू होते. हा मुलूख जंजिऱ्याच्या सिद्दीच्या अंमलाखाली होता. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कोकणात सिद्दी बलिष्ठ झाला आणि श्रीवर्धन येथील भट कुटुंबाचा त्रास वाढू लागला. राजाराम महाराजांच्या काळात कोकणात आंग्र्यांची सत्ता उदयाला येत होती आणि श्रीवर्धनचे हे देशमुख आंग्र्यांना सामिल आहेत असा जंजिरेकर सिद्दींना संशय होता.अशातच एका वर्षी मीठाचे उत्पन्न कमी झाल्याने जंजिरेकरांना ठरलेल्या जकातीचा भरणा करणे बाळाजीपंतांना शक्य झाले नाही. या जकातीच्या पुर्ततेसाठी बाळाजीपंतांचे स्नेही संभाजीपंत मोकाशी जामिन राहीले. अखेरीस बाळाजीपंत ही देशमुखी सोडून जाण्याच्या विचारात असतानाच सिद्दींनी जामिन राहिलेल्या संभाजीपंतांना जंजिर्या वरून पोत्यात बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांच्या या कारस्थानांमूळे बाळाजीपंतांना श्रीवर्धन सोडून जाणे भाग पडले. सिद्दीच्या जुलमास कंटाळून काही दिवस मुरुड येथे वैशंपायन कुटुंबाकडे आश्रय घेऊन बाळाजीपंत गेले ते थेट चिपळूणला, येथेच त्यांची प्रथम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांशी भेट झाली असावी आणि स्वामींनीच त्यांना देशावर जाण्याचा सल्ला दिला असावा. यानंतर काही बखरी आणि हकीकतींतील त्रोटक उल्लेखांनुसार बाळाजीपंत वेळासला येऊन आपले तीन आत्तेबंधू हरी महादेव, बाळजी महादेव आणि रामाजी महादेव भानू यांच्यासोबत १६९० च्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने निघाले. मध्ये जंजिरेकरांच्या हुकूमावरून अंजनवेलच्या किल्लेदारानी या बाळाजींना पकडून कैदेत डांबले पण भानू बंधूंनी त्यांची सुटका करून मग ते चौघेही सासवडला अंबाजीपंत पुरंदरे यांच्याकडे येऊन पोहोचले. नाना फडणवीस हे याच भानू घराण्यातील. वैशंपायन घराण्याने मदत केली म्हणून त्यांना कृतज्ञ भावनेतून कुलोपाध्याय नेमले गेले. एका वैशंपायन तरुणाने १२०० सैनिकांची सरदारकी मिळवली व तो मध्य प्रदेशातील सागर येथे गेला असे दिसते.भानू कुटुंबात तीन भाऊ होते. हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव त्यापैकी बाळाजी महादेव हे नाना फडणवीसांचे आजोबा. १७१९ मध्ये मुघलांनी कट करून बाळाजी विश्वनाथ यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपल्या प्राणांची आहुती देऊन बाळाजी महादेव यांनी बाळाजी विश्वनाथ यांचा जीव वाचवला. सन १६८४ साली बाळाजी विश्वनाथ चिपळूण सोडून सासवडास पुरंदरे यांच्या कडे वास्तव्यास होते. पुरंदरे हे स्वराज्यातील एक मातबर घराणे असल्याने बाळाजीपंतांना प्रथा शंकराजी नारायण सचिवांकडे आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे मुतालकी केली. बाळाजी विश्वनाथ यांनी सासवडजवळ गराडे नावाची पाटिलकी विकत घेतली. कालांतराने पुढे इ.स. १६८९ मध्ये रामचंद्र अमात्य यांच्या हाताखाली त्यांनी महसूल विभागात वसुली कारकुनाचे काम पत्करले.सन १६८४ ते सन १६९९ औरंगजेबाच्या विरूद्ध रामचंद्रपंत यांच्या सेवेत राहिले. बाळाजी विश्वनाथ सन १६९९ ते सन १७०३ पुणे प्रांताचे सरसुभेदार होते. या कार्यकाळातील कार्ये अशी नारायणगाव येथे बंधारा बांधला, नारायणगड हा किल्ला बांधला, विसापूर किल्याची डागडूजी, मोगलांशी एकिकडे मुत्सद्दी वाटाघाटी तर दुसरी कडे सिंहगड किल्यास पुरंदरे यांच्या मारफत दारूगोळा रसद पुरवठा.या काळात दिम्मत सेनापती असा बाळाजी विश्वनाथ यांचा उल्लेख येतो.
    पुढे रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कारकून असलेल्या बाळाजींचे गुण धनाजी जाधवराव यांच्या दृष्टीस पडले आणि आपल्याकडे दिवाण म्हणून त्यांची नेमणूक करून घेतली बाळाजी विश्वनाथ यांची हषारी पाहून अंबाजीपंत पुरंदरे व प्रतिनिधी यांच्या शिफारशीनुसार हि नेमणुक झाली.आपल्या कर्तबगारीने लवकरच त्यांनी वरिष्ठांचे लक्ष स्वताकडे वेधले. त्यामुळे लवकरच त्यांना सुभेदार  या पदावर बढती देण्यात आली.बाळाजी विश्वनाथांची पत वाढत जाऊन आपल्या हुशारीने ते १६९९ ते १७०३ दरम्यान पुणे प्रांताचे सरसुभेदार झाले तर सन १७०४ ते सन १७०७ दौलताबाद प्रांताचे सरसुभेदार होते तर नोव्हेंबर सन १७०५ या काळात दहा हजार फौजेनिशी दिंडोरीवर स्वारी केली. या काळात या सुभे दौलताबाद प्रांताचा उत्तम बंदोबस्त राखला.फौज बाळगून प्रतिकूल परिस्थितीत उत्तम महसूल वसूली केली. 

पेशवे बाळाजी विश्वनाथ भट समाधीस्थळ

 
 






 
  १६९५ ते १६९९ दरम्यान औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ब्रह्मपुरी येथे असताना बाळाजींचा वावर असावा, आणि याच काळात त्यांनी प्रथम लहानग्या शाहूंना पाहिले असावे. १७०३ मध्ये औरंगजेबाचा सिंहगडाला वेढा पडला असताना किल्ल्यातून बाहेर आलेल्या गृहस्थांत “बालू पंदत” म्हणजे बाळाजीपंत आहेत. यावेळेस त्यांचा उल्लेख मराठी कागदांत ‘दिम्मत सेनापती’ आढळतो म्हणजे ते धनाजी जाधवरावांच्या पदरी होते. पुढे १७०३ ते १७०७ बाळाजीपंत दौलताबादचे सरसुभेदार होते.. या सार्याह काळात बाळाजीपंतांच्या कामगिरीमूळे त्यांचे मराठमंडळाच्या निरनिराळ्या सरदारांशी नाते जुळले. सन १७०५ औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसलेला असतांना बाळाजी विश्वनाथ मोगली गुजरात स्वारीवर. झाबुआ व गोध्रा प्रांताचा मोगली सुभेदार मुरादबक्ष याचा पराभव केला. 
      छत्रपती राजाराम महाराजांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा लहानगा पुत्र शिवाजी गादीवर विराजमान झाला आणि महाराणी ताराबाई साहेब राज्य चालवू लागल्या.बाळाजी विश्वनाथ यांची ताराबाईसाहेबांकडून रांगणा किल्यावर नेमणूक केली. औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये झाला आणि त्याचा मुलगा आझमशाहाने स्वतःला बादशहा घोषित केले व शहाआलमशी लढण्यासाठी तो उत्तरेस निघाला. त्यावेळी झुल्फीकारखानाच्या सल्ल्याने त्याने छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची दिनांक ८ मे सन १७०७ रोजी दारोहा गावी   सुटका केली. येसूबाई मात्र कैदेतच राहिल्या. त्यानंतर ताराराणी आणि छत्रपती शाहूंच्या पक्षात सत्तासंघर्ष झाला.इ.स. १७०७ मध्ये जेंव्हा छ. शाहू महाराष्ट्रातआले तेंव्हा बाळाजी विश्वनाथ छ. शाहू यांना जाऊन  मिळाले.मोगलांच्या कैदैतून  छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, या करिता चाललेल्या १७०५ मधील खटपटीत ते मध्यस्थी करीत असावे असे दिसते. 
बाळाजी विश्वनाथ यांची कामगिरी :
   छ. शाहुंची बाजु बळकट केली –   
कैदेतुन सुटका झाल्यावर छ. शाहुंनी स्वराज्यावर आपला हक्क सांगितला. परंतु ताराबाई यांनी शाहुंचा दावा अमान्य केला. नोव्हेंबर १७०७ मध्ये खेड येथे झालेल्या लढाईत शाहुंनी ताराबाई यांचा पराभव झाला. खंडो बल्लाळ चिटणीस आणि बाळाजी यांच्यामुळे खेडच्या लढाईत ताराबाईंचा पराभव झाल्यानंतर धनाजीने शाहूचा पक्ष स्वीकारला. लढाईच्या वेळेस धनाजी जाधव शाहुंना सामिल झाले त्यामुळे शाहुंना विजय मिळाला. त्यानंतर शाहुंनी २२ जानेवारी १७०८ ला राज्याभिषेक करून घेतला.छत्रपती शाहूमहाराज यांच्याकडून अष्टप्रधानांच्या नेमणूका. बाळाजी विश्वनाथ यांची अमात्यांचे मुतालिक म्हणून नियुक्ती. स्वताचे छत्रपती या नात्याने स्थान प्रस्थापित करणे आणि मराठा साम्राज्याचा विस्तार करणे ही  प्रमुख आव्हाने शाहुंसमोर होती. त्यातच सेनापती धनाजी जाधव यांचा दिनांक २७ जून सन १७०८ रोजी  मृत्यु झाला. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा चंद्रसेन जाधव यांची सेनापती पदावर शाहुंनी नियुक्ती केली. परंतू चंद्रसेन जाधव यांचा कल ताराबाई यांच्या बाजूने होता. त्यामुळे शाहुंची परिस्थिती बिकट झाली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ यांनी शाहुंचा पक्ष उचलून धरला. त्यांनी आपल्या चातुर्याने पराक्रमी मराठा सरदारांना शाहुंच्या बाजूने आणले, यात मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांचाही समावेश होता. शाहू महाराजांनी बाळाजीच्या या कामगिरीने खुश होऊन १७११ मध्ये होनाजी अनंतांकडे असलेले “सेनाकर्ते” हे पद आणि २५१०२०० ( पंचवीस लाख दहा हजार दोनशे रूपयांचा ). रुपयांचा सरंजाम बहाल केला आणि बाळाजींनीही हे पद सार्थ करून दाखवले.१७१३ मध्ये शाहू महाराजांनी मोगलाईतून चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा हे हक्क वसूल करण्यासाठी बाळाजीपंत आणि चंद्रसेन जाधव या दोघांना पाठवले असता दोघांच्यात तंटा उत्पन्न होऊन चंद्रसेन जाधवाने बाळाजींना पांडवगडाजवळ अडवून धरले. याप्रसंगी बाळाजींचे स्नेही पिलाजी जाधवराव वाघोलीकर यांनी बाळाजीपंतांची सुटका केली. पुढे सरदार निंबाळकरांना शाहू महाराजांनी नगरहून बोलावून घेतले आणि जाधवांचा पुर्ण पराभव होऊन ते ताराबाईच्या पक्षाला उघड उघड जाऊ मिळाले. याच सुमारास कोकणात ताराबाईंमार्फत कान्होजी आंग्रे हे शाहूंच्या विरोधात उतरले आणि त्यांनी पेशव्यांचे राजमाची-लोहगड-विसापूर इत्यादी किल्ले काबिज केले. दुसरेही काही सरदार ताराबाईस जाऊन मिळाले. 
त्याच वेळी काही मोगल अधिकाऱ्यांनी शाहूला विरोध करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे शाहूना शत्रूने वेढले होते. बाळाजीने कर्जे काढून फौजा उभारल्या आणि कृष्णराव खटावकर, दमाजी थोरात, उदाजी चव्हाण यांसारख्या पुंडांचा आणि छत्रपतींच्या इतर शत्रूंचा उपशम केला. सेनाकर्ते ही पदवी त्याने सार्थ केली. कान्होजी आंग्रे हा त्या वेळी ताराबाईला मिळाले. राजमाचीआणि लोहगड घेऊन पुण्यावर त्यानी स्वारी केली. शाहूने त्याचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण पेशव्याचा पराभव होऊन तोच कान्होजीच्या कैदेत पडला. याच स्वारीत श्रीपतराव प्रतिनिधी यांनी गाजविलेल्या पराक्रमामुळे शाहूमहाराजांच्या कैदेत असलेले परशुरामपंत प्रतिनिधी यांची कैदेतून सुटका. दिनांक १६ मार्च सन १७१३ रोजी परशुरामपंत प्रतिनिधी यांची पेशवा म्हणून नियुक्ती. आंग्रे यांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची चालढकल. दिनांक १९ जून सन १७१३ रोजी पेशवा परशुरामपंत प्रतिनिधी यांची पून्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती.  अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाळाजीपंतांनी सन १७१८ जानेवारीत पोलवण येथे सरखेल कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करून त्यांच्याकडून बहिरोपंतांची सुटका केलीच, पण किल्लेही परत मिळवले. दिनांक २८ फेब्रुवारी सन १७१४ रोजी पेशवे व आंग्रे यांच्यात सलोख्याचा तह. बहिरोपंत पिंगळे व निळो बल्लाळ चिटणीस यांची सुटका. सरखेल कान्होजी आंग्रे शाहूमहाराजांच्या पक्षात आल्याने पश्चिम किनारपट्टीवर शाहूमहाराज यांची सत्ता स्थापन झाली. बाळाजीनी मुत्सद्देगिरीने कान्होजीस शाहूच्या पक्षात ओढले आणि त्यास सरखेलपद बहाल करविले.बाळाजी विश्वनाथांनी छत्रपती शाहू महाराजच मराठेशाहीचे योग्य वारसदार असून त्यांचे सहकार्य लाभले तर कान्होजी आंगरे कोकणावर वर्चस्व निर्माण करू शकतील हे त्यांना पटवून दिले आणि मुख्य म्हणजे कान्होजींसारखा दर्याबहाद्दर ताराबाईंचा पक्ष सोडून कायमचा शाहू महाराजांना सामिल झाला. आणि छत्रपती शाहू महाराजांची बाजू बळकट झाली. नोव्हेंबर सन १७१५ पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी पुणे प्रांत स्वराज्यात आणला.
    पेशवा पद दिनांक १९ जून सन १७१३ ते दिनांक १६ नोव्हेंबर सन १७१३ पर्यंत रिक्त होते. या मोहीमेपूर्वीच शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद बहाल केले होते.खुद्द बहिरोपंत कैद झाल्याने शाहू महाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न पडला असताना अंबाजीपंत पुरंदर्यांदनी बाळाजीपंतांचे नाव सुचवले. शंकराजीपंतांनीही “बाळाजीपंत भट यांजकडे फौजेचे वळण आहे, पेशवाई त्यांस द्यावी” असा पुरंदर्यांवना दुजोरा दिला. आणि दि. १७ नोव्हेंबर १७१३, पुण्याजवळील मांजरी या गावी बाळाजीपंतांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. यासोबतच बाळाजीपंतांनी आपल्या आत्तेबंधूंचे आणि अंबाजीपंतांचे उपकार लक्षात घेऊन भानू बंधूंना “फडनिशी” आणि पुरंदर्यांतना “मुतालकी” बहाल केली. यानंतर २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये आंग्रे आणि पेशवे यांच्यामध्ये सलोखा होऊन आंग्रे स्वराज्यात आले. १७१६ च्या प्रारंभी दमाजी थोरात हिंगणगावकर याने शाहू महाराजांविरुद्ध दंगा मांडल्याने पेशव्यांना रवाना केले. बाळाजीपंत दमाजीला भेटायला गेले असता दम्माजीने ‘फितूर दगाबाजी करून’ बाळाजीपंतांना परिवारासह अटक केले आणि पैसा-खंडणी द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरून मांस काढेपर्यंत हाल केले. यानंतर खंडणी ठरवून म्हणून अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवराव बाहेर पडून खंडणीची तरतूद करून सर्वजण सुटले. यावेळेस कान्होजी आंग्रे कोकणात असल्याने आणि कोल्हापूरकरांनी शाहूंकडील सरदार फोडल्याने अपुर्या सैन्यबळामूळे दमाजीवर मोहीमकरता आली नाही. पण काही महिन्यातच १७१७-१८ च्या दरम्यान बाळाजीपंतांनी हुसेनअली सय्यदाच्या मदतीने थोराताचा संपूर्ण पराभव करून हिंगणगावची गढी जमिनदोस्त केली. सन १७१७ - १८ पेशवा बाळाजी विश्वनाथ आणि हुसैन अली सय्यद यांनी थोरातांचा पूर्ण पाडाव केला. गुजरात, खानदेश आदी बादशाही मुलखात मराठ्यांनी छापेमारी आरंभली.१७१८ पर्यंत बाळाजींचा मुक्काम सासवडला पुरंदर्यांच्याच वाड्यात होता.पुढे काही काळ ते सुप्याला राहिले.या काळात सासवडच्या नव्या वाड्याचे काम सुरु होते. पुन्हा २३ मे १७१९ रोजी पेशवे सासवडच्या नव्या वाड्यात रहायला आले. सेनापती चंद्रसेन जाधवाच्या नंतर बाळाजीपंतांच्या विनंतीवरून खंडेराव दाभाड्यांना ‘सेनापती’पद बहाल करण्यात आले.
 शाहूने बाळाजीस पेशवेपद दिले. (१७१३). आंग्र्यांशी झालेल्या करारनाम्याने बाळाजी पेशव्याने एक मोठा प्रश्न निकालात काढला. १६८१ पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात जाधव, घोरपडे, भोसले, दाभाडे, आंग्रे इ. सरदारांना आपापल्या हिमतीवर फौजा उभारून मुलूख जिंकून त्यांवर अंमल बसविला होता. या सरदारांना त्याने एकत्र आणले व नवीन सरदार उत्पन्न केले. या प्रबळ सरदारांचे आणि छत्रपतींचे संबंध कसे असावे, हा गुंतागुंतीचा प्रश्न होऊन बसला होता. सरदार-जाहगीरदारांचे महत्त्व वाढत चालले होते.कालांतराने २७ नोव्हेंबर १७१३ ला पेशवेपदी बाळाजींची नेमणूक केली.एकतंत्री राजसत्ता जाऊन मराठी सत्तेला सरंजामी सत्तेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशा वेळी आंग्र्यांशी झालेला करार हा या बदलत्या राजकारणाचा पहिला आविष्कार होता. यामुळे एक एक सरदार शाहूच्या आधिपत्याखाली येत गेला आणि स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखी यांच्या सनदांनी जो मुलूख आणि जे हक्क छत्रपतींस प्राप्त झाले, ते अष्टप्रधान आणि इतर सरदार यांत शाहूतर्फे वाटले गेले. सन १७१४ आंग्रे - पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले.सन १७१४ आंग्रे - पेशवे यांच्या संयुक्त स्वारीने जंजीरेकर हबशाकडील काही किल्ले स्वराज्यात आणले.
दिल्लीच्या राजकारणात  मराठ्यांचा प्रथमच प्रवेश –  
     बाळाजीने दुसराही असाच एक महत्त्वाचा प्रश्न सोडवून मराठी राज्याला स्थैर्य आणले. छ. शाहुंनी आपले आसन बळकट केल्यानंतर दक्षिणेतील चौथाई आणि सरदेशमुखीचा हक्क आपल्याला मिळावा असा आग्रह मोगल बादशहाकडे केला.नेमके त्यावेळेस दिल्लीच्या तख्तासाठी गृहकलह सुरु होता.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूखसियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांचे वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्याच्या बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यद बंधूंना मित्र शोधावे लागले. दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजीचे स्वराज्य बिनशर्त शाहूला देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्क मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहूने पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गेले,अशाप्रकारे मराठ्यांचा दिल्लीच्या राजकारणात प्रवेश झाला.
DSC01353
थोडे पुढे जाताच एका पुलावरून आम्हाला हे विदारक दृश्य दिसले. या थोर पेशव्याची, अजिंक्य बाजीराव पेशवयांच्या वडिलांची समाधी आणि अशी घाण अवस्था! पण दाह थोडा शांत तेव्हा झाला जेव्हा कळले की या वेळी आलेल्या अतिवृष्टीमुळे गाळ साचून समाधीची अशी अवस्था झाली आहे. तरी…
 थोडे पुढे जाताच एका पुलावरून आम्हाला हे विदारक दृश्य दिसले. या थोर पेशव्याची, अजिंक्य बाजीराव पेशवयांच्या वडिलांची समाधी आणि अशी घाण अवस्था! पण दाह थोडा शांत तेव्हा झाला जेव्हा कळले की या वेळी आलेल्या अतिवृष्टीमुळे गाळ साचून समाधीची अशी अवस्था झाली आहे. तरी…  चौथाई आणि सरदेशमुखीची सनद प्राप्त केली:
 DSC01367
 मराठ्यांच्या पेशवयांची वंशावळ.
 
           छ. शाहुंनी सय्यद बंधूंना मदत करण्यास होकार दिला त्यावेळी सय्यद बंधू आणि बाळाजी विश्वनाथ यांच्यात १७१८ चा तह झाला. त्या तहानुसार मराठ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे होत्या. १) मोगलांच्या दक्षिण हिंदुस्थानातील सहा प्रांतातील चौथाई आणि सरदेशमुखीची सनद मराठ्यांना मिळेल. २) मोगल बादशहाने महाराणी येसुबाई आणि अन्य व्यक्तींची सुटका करावी. ३) छ. शाहुंनी मोगल सम्राटाचे सार्वभौमत्व मान्य करावे आणि दरवर्षी दहा लक्ष रुपये खंडणी द्यावी. ४) शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असलेला सर्व प्रदेश शाहुंना परत करावा. ५) वऱ्हाड,खानदेश, गोंडवना आणि कर्नाटक इ. जिंकलेले प्रदेश छ. शाहुंकडे राहतील.
    या तहामध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे महत्व नाकारता येत नाही. या तहाची सर्व कलमे मान्य करण्यात आली. तहानुसार पेशवा बाळाजी विश्वनाथ,थोरला मुलगा बाजीराव  आणि सेनापती खंडेराव दाभाडे  पंधरा हजार फौजेनिशी सय्यद अलीसह १७१८ साली दिल्लीवर चालून गेले. सय्यद अलीने मराठ्यांच्या सहाय्याने फारुखसियरला पदावरून काढून रफी-उद-दरजात यास दिल्लीच्या तख्तावर बसविले .या १७१८ च्या तहानुसार मराठ्यांच्या मागण्या मोगल सम्राटाने मान्य केल्या. या तहानुसार मराठ्यांना दक्षिणेतील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला. या सनदांवर १३ मार्च १७१९ आणि २५ मार्च १७१९ अशा तारखा आहेत. तसेच महाराणी येसुबाई व अन्य व्यक्तींची प्रदीर्घ कालावधीनंतर मुक्तता करण्यात आली. छ्त्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि इतर मंडळीना घेऊन जुलै महिन्यात पेशवा बाळाजी साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटला. खर्च वजा जातात ३० लाखांची मिळकत त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना नजर केली.
   मराठ्यांच्या इतिहासात या तहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तहाद्वारे  मराठ्यांना दक्षिणेतील सहा सुभ्यांमध्ये जवळपास ३५ टक्के महसूल वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला.  येथूनच दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांना महत्त्व प्राप्त झाले. अर्थात याचे श्रेय पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनाही जाते.अशा रीतीने शाहूच्या सत्तेला मान्यता आणि स्थैर्य बाळाजी विश्वनाथने मिळवून दिले.
सन १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी चासकर जोशी यांच्यामार्फत कल्याण - भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला. यानंतर बेळगांव, रूकडी, तावळे डिग्रज या भागात मोठी मोहीम राबविण्यात आली. थोरातांचा पून्हा बंदोबस्त करून आष्टा व येळावी ही दोन महत्त्वपूर्ण ठाणी ताब्यात घेतली. कोल्हापूरकर संभाजी राजे आणि शाहूमहाराज यांच्यात वैमनस्य वाढत होते. दरम्यान पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी कोल्हापूरला वेढा घातला. दिनांक २० मार्च सन १७२० रोजी कृष्णतीरावरील उरणबाहे येथे कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पराभव करून त्यांनी संभाजी राजेंना साताऱ्यास राजदर्शन घडविले. साताऱ्यास दोन्ही राजबंधूंच्या भेटीगाठी झाल्या. राजकीय खलबते झाली. मात्र पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचे हे अखेरचे राजदर्शन ठरले. छत्रपती शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांचा "अतुल पराक्रमी सेवक" अशा शब्दात गौरव केला होता. या एका वाक्यातच त्यांच्या सर्व काही सामावले आहे.
या मोहिमेनंतर सासवड येथे घरी परतल्यावर चाळीस वर्षांच्या अविश्रांत दगदगगीने पेशवा बाळाजी विश्वनाथ आजारी पडले. भट घराण्यातील प्रथम पेशवे स्वर्गीय बाळाजी विश्वनाथ यांनी तिथीनुसार व तारखेनुसार  शार्वरीनाम संवत्सर, चैत्र शुद्ध ६, राजशक ४६, दिनांक २ एप्रिल सन १७२० रोजी अखेरचा श्वास घेतला.बाळाजी विश्वनाथ पेशव्याचे १७२० साली निधन झाले आणि थोरले बाजीराव वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी पेशवेपदावर नियुक्त झाले.
पेशवा बाळाजी विश्वनाथ यांची योग्यता :
       बाळाजी विश्वनाथ हे आपल्या अंगीभूत कौशल्यामुळे मराठेशाहीत सामान्य कारकुन ते पेशवेपदपर्यंत पोचले. स्वताच्या कर्तबगारीने त्यांनी मराठ्यांच्या इतिहासात  आपले नाव नोंदविले. कोकणातील एका गरीब ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. परंतू दीर्घ परिश्रम, पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि महत्वाकांक्षा या गुणांच्या  बळावर त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाचे स्थान  प्राप्त केले.
    जेंव्हा छ. शाहुंना खरोखरच मदतीची गरज होती तेंव्हा बाळाजी विश्वनाथ यांनी छ. शाहुंची बाजु घेतली. शिवाय इतर पराक्रमी मराठा सरदारांना छ. शाहुंच्या बाजूने वळविले. स्वराज्यातील सर्व प्रमुख सरदारांत एकोपा निर्माण करुन शाहुंच्या नेतृत्वाखाली आणले.मराठा आरमाराचा प्रमुख कान्होजी आंग्रे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शाहुंच्या बाजूने वळविले. त्यामुळे छ. शाहुंची स्थिती लष्करीदृष्टया मजबूत झाली.
     सय्यद बंधूंसोबत केलेल्या तहावरून बाळाजी विश्वनाथ यांची मुत्सद्देगिरी दिसून येते. छ. शाहुंना केवळ नाममात्र मोगलांचे स्वामीत्व मान्य करावे लागले. त्याबदल्यात जवळपास ३० वर्षांपासून कैदेत असलेल्या महाराणी येसुबाई यांची मोगलांच्या कैदेतुन मुक्तता झाली.  दक्षिणेतील सहा सुभ्यांची चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला. शिवाय दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांना महत्त्व प्राप्त झाले. बाळाजी विश्वनाथाने सय्यद बंधूंशी तह करून मोगली राजकारणात प्रवेश मिळविला. या प्रवेशामुळे बाजीराव पेशव्यांस उत्तरेकडे मराठी राज्याचा विस्तार करता आला. चौथ-सरदेशमुखीचे जे हक्क पेशव्याने मिळविले ते वसूल करण्याच्या निमित्ताने मराठी फौजांचा संचार दक्षिणेत चोहोकडे सुरू झाला व त्यांच्या वाढत्या पराक्रमास वाव मिळाला.
     मोगल बादशहाकडून चौथाई आणि सरदेशमुखीच्या ज्या सनदा मराठ्यांना  प्राप्त झाल्या होत्या त्यांची वाटणी बाळाजी विश्वनाथ यांनी व्यवस्थितपणे करुन दिली. त्यानुसार पेशव्यांकडे खानदेश , बालाघाट तर सेनापती खंडेराव दाभाडे यांच्याकडे बागलाण आणि गुजरात हे प्रदेश आले. फत्तेसिंग भोसले यांच्याकडे कर्नाटक , प्रतिनिधी यांच्याकडे हैद्राबाद, बिदर,नीरा आणि वारणा या नद्यांमधील प्रदेश आला. सरलष्कर निंबाळकर यांच्याकडे गंगथडी व औरंगाबाद हे प्रांत आले. तर गोंडवना आणि  वऱ्हाड हे प्रांत कान्होजी भोसले  यांच्याकडे आले. अशाप्रकारे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी वरील सहा सुभ्यांचे व्यवस्थित नियोजन केले.
    पेशवा बाळाजी विश्वनाथ हे केवळ एक योध्ये आणि मुत्सद्दीच नव्हते तर एक उत्तम संघटक व प्रशासक पण होते. राज्याचा खर्च  चालविण्याकरिता त्यांनी एक नविन पद्धत अंमलात आणली. मराठे सरदार चौथाई आणि सरदेशमुखी हे कर परप्रांतातुन वसूल करीत.सरदेशमुखीच्या उत्पन्नावर राजाचा हक्क असे म्हणून ते उत्पन्न राजाला दिल्या जाई. मात्र चौथाईचे जे उत्पन्न मिळे त्यातून १/४ हिस्सा सरंजामदार राजाला देई.याद्वारे राज्याच्या खर्चास मदत होत असे.
    बाळाजी विश्वनाथ यांनी छ. शिवाजी महाराजांची आदर्श राज्यव्यवस्था बाजूला सारली आणि वंशपरंपरागत जहागिरिची पद्धत पुन्हा सुरु केली. या सरंजामशाहीमुळे मराठा सरदारांमधील ऐक्य नष्ट होऊन मराठा साम्राज्य लयास गेले.असा आरोप त्यांच्यावर घेण्यात येतो. परंतू तत्कालीन परिस्थिती बघता साम्राज्य विस्तार करण्यासाठी जहागिरी देण्याशिवाय पर्याय नव्हता. मोगल बादशहा अशा जहागिरी देतच असत. त्यामुळे स्वराज्यातच जहागिरी देऊन साम्राज्य विस्तार करणे. हा हेतु पेशव्यांचा असावा. कालांतराने मराठा साम्राज्याचा विस्तार होऊन मराठ्यांचा झेंडा अटकेपार गेला.
    श्रीवर्धन शहरात जिथं त्यांचा वाडा होता त्या ठिकाणी आता ब्रॉन्झ धातूचा सुंदर पुतळा उभारून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.
 यानंतर सासवड परिसरात जन्म झालेल्या आणि शिवकाळात पराक्रमाने इतिहासात नाव कोरलेल्या आणखी एका महावीराची माहीती घेउया. 

सूर्यराव काकडे :- 

 स्वराज्याच्या "रायरेश्वरा" वरील शपथी पासून शिवाजी महाराजांना साथ देणाऱ्या मोजक्या सुरवातीच्या लोकांमध्ये" सूर्यराव काकडे" यांचे नाव घ्यावे लागेल .  "सूर्यराव काकडे" ज्यांना इतिहासात "सूरराव" किंवा "सूर्याजी" या नावाने सुद्धा ओळखले जाते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी सुरवातीच्या काळात भोर खोरे , हिरडस ,कऱ्हे पठार ,मावळ, मुळशी खोऱ्यातील पुणे परिसराच्या जवळचेच मावळे गोळा केलेले दिसतात .सूर्यराव काकडे यांच्या बद्दल बखरकार म्हणतो " सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याच प्रतिभेचा " यावरून आपल्याला सूर्यराव काकडे यांची कल्पना येते
. सूर्यराव काकडे सासवड पासून जवळच पांगारे गावाचा .तालुका -पुरंदर ,जिल्हा पुणे . स्वराज्याच्या रायरेश्वरवर हजर असणाऱ्या तान्हाजी मालुसरे ,सूर्याजी मालुसरे ,येसाजी कंक, बाजी जेधे सोनोपंत डबीरांचा मुलगा त्र्यंबक,बापूजी मुगदल नारोबा देशपांडे,चिमणाजी देशपांडे,बाळाजी देशपांडे दादाजी गुप्ते बाजी पासलकर यांच्या मध्ये पुरंदरचा सूर्यराव काकडेही हजर होता
. स्वराज्यामध्ये भोर जवळील रोहिडा किल्ला समाविष्ट करण्यात सूर्यराव काकडे यांचा मोठा वाट दिसून येतो
. रोहिडा किल्ला हा मोगलांकडे होता. या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला . किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली.
अफजल खान प्रकरणाच्या आधी ज्या वेळेला जावळी ताब्यात घेण्याची मोहीम शिवरायांनी आखली. सूर्यराव काकडे यांच्या वर त्या वेळेला जावळीच्या मोर्‍यांचा पडाव करण्याची मोठी जवाबदारी सोपवण्यात आली. त्या घटने विषयी बखरकार सभासद लिहितात की "या उपर चंद्रराव मोरे व शिवाजी महाराजांचा थोर आकस पडला. शिवाजी महाराजांनी सूरराव (सूर्यराव) काकडे,दोन हजार हशम जावळीस रवाना केले. महाबळेश्वरचा निसनीचा घाट आणि दर्या उतरून जावळीस वेढा घातला. जावळीच्या अवघड वाटा, जाळ्या काळकीच्या दाट. तेथे महिनाभर झुंज झाहले". या युद्धात सूर्यरावांनी पराक्रमाची शर्थ केली,मो-यांना चारही बाजुनी बेजार केले. त्यामुळे कृष्णाजी बाजी मोरे यास जावळी सोडून पळून जावं लागलं आणि तो रायरीच्या (रायगडाच्या) आसऱ्याला गेला.
         सूर्यराव काकडे यांचा उल्लेख व पराक्रम साल्हेर लढाईमध्ये आढळून येतो. साल्हेरचे युद्ध इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला. मराठ्यांच्या ताब्यात असलेला महत्वाचा साल्हेर किल्ला जिंकण्या साठी औरंगजेबाची सेना साल्हेरला वेढा घालून बसली होती. त्यामध्ये बहलोलखान, ईखलास खान मियाणा, मोहक्कम सिंग चंद्रावत, द्वारकोजी भोसले, राव अमरसिंह आणि इतर बरेच बडे बडे मुघली सरदार, अमलदार आणि त्यांची सेना होती. तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठवले.  या वेळेस आक्रमण करण्यासाठी गेलेल्या मराठी फौजेमध्ये मोरोपंत पेशवे पायदळासह, प्रतापराव गुजर घोडदळ घेऊन होते. त्यांच्या बरोबर आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रूपाजी भोसले, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, गोदाजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ यांच्या बरोबर आणखी एक वीर म्हणजे स्वराज सेनेचे पंचहजारी सरदार सूर्याजी काकडे होते. 
इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. पुन्हा एकदा बखरकार सभासदाने या युद्धाचे यतार्थ वर्णन केलेले आहे, ते असे "‘एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली. मोठे युद्ध जाहले.अशी धुंदी कधी उडाली न्हवती. पृथ्वीचा धुराळा असा उडाला कि तीन कोश औरस चौरस कोणास आपले व परके माणूस दिसत न्हवते. हत्ती रणास आले .दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले . घोडे ,उंट,हत्ती ,आराबा यास गणना नाही. रक्ताचे पूर वाहिले रक्ताचे चिखल जाहले . त्यामध्ये पाय रुतो लागले.असा कर्दम जाहला. मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती. मराठी फौज त्यांच्या सुमारे पन्नास हजार इतकीच होती. मोगल, पठाण, रजपूत, तोफची, हत्ती, उंट, आराबा घालून युद्ध जाहले. जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजांकडे गणतीस आले. सवाशे हत्ती सापडले. सहा हजार उंट सापडली. मालमत्ता, खजिना, जडजवाहीर, कापड अगणित बिछाइत हातास लागली. बेवीस वजीर नामांकित धरिले.खासा इख्लासखान पाडाव झाला. हजार-दोन हजार सडे, सडे पळाले, असे युद्ध जाहले.’प्रतापराव सरनौबत ,आनंदराव,व्यंकोजी दत्तो,रुपाजी भोसले सूर्यराव काकडे ,विसाजी बल्लाळ मोरो नागनाथ,मुकुंद बल्लाळ वरकड बाजे वजीर उमराव ऐसे याणी शिकस्त केली .तसेच मावळे लोक याणी व सरदारांनी कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनौबत या उभयतांनी आंगीजणी केली . आणि युद्ध करिता सूर्यराव काकडे पंचहजारी ,मोठा धारकरी ,याणे युद्ध थोर केले. ते समयी जंबुरीयाचा गोळा लागून (सूर्यराव )पडिला . वरकड ही नामांकित शूर पडले असे युद्ध होऊन (मराठ्यांची )फत्ते जाहली "
शिवाजी महाराज म्हणाले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता.'
या युद्धात ईखलासखान आणि मुहकमसिंह चंद्रावत जायबंदी होऊन मराठ्यांच्या तावडीत सापडले, द्वारकोजी भोसलेही कैद झाला. तर राव अमरसिंह आणि त्याचे सहकारी लढता-लढता मारले गेले.
(ईथे आवर्जुन नमुद करावेसे वाटतेकी शिवयुद्धनिती नुसार शरण आलेल्या युद्धकैद्यांना मानाने सोडुन देण्याच्या नियमा नुसार ईखलासखान वगैरेंना सोडुन देण्यात आले) साल्हेरच्या युद्धाचा मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. ते शिवाजी अजिंक्य आहे असे मानू लागले.सूर्यराव काकडे यांच्या शिवाय" रामजी काकडे" हा सरदार शिवाजी महाराजांच्या पदरी चाकरी करीत होता
. "बाजी काकडे "या सरदाराने छत्रपती राजाराम महाराज यांची इमाने इतबारे सेवा केली. सुंदररओ काकडे व त्याचा भाऊ पानिपतच्या युद्धामध्ये मराठयांकडून लढताना धारातीर्थ पडले आहेत .
या पुरंदर तालुक्यातील अनेक सरदारांनी आपल्या प्राणांची आहुती स्वराज्यासाठी दिलेली आहे .काकडे घराण्यातील अनेक सरदारांनी आपले रक्त या स्वराज्यासाठी सांडले आहे. स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या बाजी पासलकर, बांदल सेना, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, रामजी पांगेरा, नागोजी जेधे अशा असंख्य वीरांच्या यादीत आणखीन एक ठळकपणे घेण्यात येणारे नाव म्हणजे महावीर,महाबली सरदार सूर्याजी काकडे. यांचा इतिहास अल्प प्रमाणात माहित आहे, 

राजे उमाजी नाईक :-

राजे उमाजी नाईक ( ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि..... भारतीय स्वातंत्र लढ्यातील.... सशत्र क्रांतीचे प्रथम जनक मानले जाते.
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले. ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
३ फेब्रुवारी हा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.
क्रांतिकारकांत राजे उमाजी नाईक हे तसे उपेक्षित राहून गेले. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे ती नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन याने १८२०ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?" तर मॅकिन्टॉश म्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.
उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी नाईक खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला. वडिल दादोजी नाईक खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. त्यामूळे राजे उमाजी नाईक यांचे गुरू हे त्यांचे वडील दादोजी नाईक खोमणे च होते.या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरू केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजीराजे बेभान झाले. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठोजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बापू सोळस्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजीराजे नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखा धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीराजेंना सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्यांनी त्याकाळात तुरंगात लिहिणे वाचणे शिकले. या घटनेचे इंग्रज आधिकारी कॅप्टन मॅकिन्टॉश याने फार आश्चर्य व कौतुक केले. आणि तुरूंगातून सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्यांचा कारवाया आणखी वाढल्या. उमाजीराजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांना साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीराजेंना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॅकिन्टॉश याने सासवड-पुरंदरच्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीराजेंच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीराजेंचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका सैन्य तुकडीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
इंग्रजांणसारख्या बलाढ्य शत्रुशी मुकाबला करायचा म्हणजे मोठे मणुष्यबळ असायला हवे. म्हणजेच सैन्य व प्रचंड खर्च आलाच. पण उद्देश महान असल्यामुळे ते साधनाअभावी थांबले नाहीत.ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानायचे असे खुद्द इंग्रज आधिकारी कॅप्टन मॅकिन्टॉश याने नमूद केले आहे. २४ फेब्रुवारी १८२४ला उमाजीराजेंनी भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. २२ जुलै १८२६ साली आद्यक्रांतिकारक उमाजींचा राज्याभिषेक कडेपठार, जेजुरी या ठिकाणी करण्यात आला. त्यांनी छत्रचामर, अबदागीर, इ. राजचिन्हे धारण केली. दरबारात ते भिक्षुक-पुजारी यांना दक्षिणा व गोरगरिबांना दान देत असत. उमाजीराजेंनी विभागनिहाय सैन्य प्रमुख व त्यांच्या तुकड्या नेमून सर्व भागात तैनात केल्या होत्या आणि त्यांना कामे वाटून दिली होती. तसेच त्यांनी एकमेकांशी संपर्क, दळणवळण, इंग्रजांच्या बातम्या तसेच लोकांचा बातम्या, इ. कामासाठी हेरखातेही निर्माण केले होते.विभागनिहाय गुप्तहेरखाते नेमले होते. सैन्यात व गुप्तहेरखात्यात सर्व जाती-धर्माचे लोक होते.
२८ ऑक्टोबर १८२६ साली उमाजीराजेंविरुद्ध इंग्रजांनी १ला जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्यात उमाजीराजे व त्यांचा साथीदारांना पकडणाऱ्यास मोठ्या रकमेची बक्षिसे व इनाम जाहिर केले व या क्रांतिकारकांना मदत करणाऱ्यास शिक्षा जाहीर केली.पण जनतेने इंग्रजांना मदत केली नाही. यातून उमाजीराजेंची लोकप्रियता दिसून येते. अशाच प्रकारे २ रा जाहिरनामा इंग्रजांनी ८ ऑगस्ट १८२७ साली प्रसिद्ध केला. त्यात बक्षिसाची रक्कम वाढवली व शरण येणाऱ्यास माफी देण्याचे अभिवचन देण्यात आले. तरीही कोणीही मदत केली नाही. कारण लोक उमाजीराजेंना इंग्रजांविरुद्ध एक आशास्थान म्हणून पाहू लागले होते. २० डिसेंबर १८२७ साली उमाजीराजे व इंग्रजांच्या झालेल्या युद्धात इंग्रजांना पराभव पत्करावा लागला. उमाजीराजेंनी ३ इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. कॅप्टन डेव्हिस पासून ते लेफ्टनंट पर्यंत सर्वच लालबुंद झाले. ३० नोव्हेंबर १८२७ला इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. इंग्रजांनी ३ रा जाहिरनामा उमाजीराजेंविरुद्ध प्रसिद्ध करून बक्षिसाची रक्कम दुप्पट केली.त्याचाही काही उपयोग झाला नाही. जंजिऱ्याचा सिद्दी नवाब याने उमाजीराजे कोकणात गेले असताना त्यांना मदत मागितली होती. २४ डिसेंबर १८३०ला उमाजीराजेंनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते आणि काहीचे प्राण घेतले. २६ जानेवारी १८३१ साली इंग्रजांनी ४ था जाहिरनामा प्रसिद्ध केला व त्यात उमाजीराजेंना पकडून देणाऱ्यास ५०००रुपये रोख बक्षिस व २००बिघे (१००एकर)जमीन जाहिर करण्यात आली. पण तरीही कोणीही इंग्रजांना मदत केली नाही. अशा प्रकारे उमाजीराजेंचा भारताचा स्वातंत्र्यासाठी असनाऱ्या लढ्यास सर्व राजे-रजवाडे, संस्थानिक, जनता पाठिंबा देत होते.
उमाजीराजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, "लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे , सरदार जमीनदार, वतनदार, देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. असे करणाऱ्यास नवीन सरकारमधून जहागिरी, इनामे वा रोख पैशाची बक्षीसे मिळतील. ज्यांची वंशपरंपरागत वतने, तनखे, इ. इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती सर्व त्यांना परत केली जातील
राज्याची स्थापना होइल. इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल" असे सांगून उमाजीराजेंनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. संपूर्ण क्रांतिकारकांचा इतिहासात अशा प्रकारचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसतो. हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पानच आहे. म्हणूनच उमाजीराजे हे आध्यक्रांतिकारक ठरतात. तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजे बनले. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीराजेंना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली. इंग्रजांनी उमाजीराजेंविरुद्ध ५वा जाहिरनामा प्रसिद्ध केला. माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये रोख आणि चारशे बिघे (200एकर) जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. हा इनाम त्या काळात अगनित होता. त्यांच्या जवळचा एक माणूस फितूर झाला व याने उमाजींराजेंची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजींनी ज्याचा हात कापला होता तो काळोजी नाईक देखील सूडभावनेने इंग्रजांना जाऊन मिळाला. दुसरीकडे नाना चव्हाण याने देखील १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीनीच्या बदल्यात इंग्रजांचे पाय चाटले. या दोघांनी उमाजींची सर्व खबर इंग्रजांना दिली आणि उमाजी आपल्याच माणसांमुळे सापळ्यात अडकले.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले. अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिन्टॉश दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले. जीवंतपणी सतत ताठ राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकली. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीराजेंचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीराजेंसोबत इंग्रजांनी त्यांचे साथीदार इ.स. १८७९ मध्ये सातारा येथील हरि माकजी यांना तर पुढे खुशाबा नाईक आणि बापू सोळस्कर यांनाही फाशी दिली.
अशा या धाडसी उमाजीराजेंनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी उमाराजेंचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता. त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील
   यानंतर सासवड शहरातील वाड्यांची आपण माहिती घेणार आहोत. 

सरदार पुरंदरे वाडा :-

   पेशवाईमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या पुरंदरे घराण्याचे इतिहासात उल्लेख सापडतात. शके १६२५ (सन १७०३) मधील एका पत्रात ‘कसबे’ सासवडचे कुलकर्ण व कर्यात सासवडचे कुलकर्ण पदाबद्दल समस्त पुरंदरे यांनी अत्र्यांशी वाद घातले अशी नोंद आहे. शके १६१४ (सन १६९२) च्या फाल्गुन महिन्यात तुकोपंत पुरंदरे, धनाजी जाधवांबरोबर चंदीस (जिंजीस) जाऊन जमिनीच्या सनदा घेत आहे, अशी एका पत्रात नोंद आढळते. यावरून असे म्हणता येईल की, पुरंदरे घराण्याकडे परंपरागत कुलकर्ण वतन होते. या घराण्यातील अंबाजीपंत ही व्यक्ती धनाजी जाधवराव यांच्या बरोबरीचीच असल्याचे दिसते. शके १६१४ मध्ये पुरंदरे मराठ्यांचे साक्षात नोकर होते. शके १६२४ मध्ये ते सुखवस्तू रयत आहेत.
        सासवड गाव कधी मोगलांकडे तर कधी मराठ्यांकडे असे. शके १६२३ मध्ये अत्रे आणि पुरंदरे यांचा वाद असल्याचे दिसते. रामचंद्रपंत अमात्य, सेनापती धनाजी जाधवराव, सचिव शंकराजी नारायण यांच्याशी पुरंदरे यांचा दृढ परिचय होता. या घराण्यातील ‘हेरंब’ नावाचा माणूस बराच महत्त्वाचा होता. तुको त्र्यंबक, अंबाजी त्र्यंबक या बंधुद्वयाखेरीज त्यांचे चुलत भाऊ काशी, गोमाजी, गिरमाजी, विश्वनाथ व भाऊबंद चिंतो महादेव पुरंदरे हेसुद्धा आपल्या बकूबाप्रमाणे राजकारणात वावरत होते. सेनापती धनाजी जाधवराव यांच्या कृपेने यांना थोर पद प्राप्त झाले.
     छ. शाहूमहाराज सुटून आल्यावर लामकानी (खानदेश) येथे अंबाजीचा पुतण्या मल्हार तुकदेव हा शाहूराजांना भेटला. त्या वेळी काही अत्रेमंडळीही शाहूराजांकडे सामील झाली. सन १७०८ मध्ये शाहूराजे सातारला विधियुक्त अभिषेक करून छत्रपती झाले. अंबाजीपंत व खंडो बल्लाळ यांचा स्नेह जुळला. पंतांच्या सहाय्याने बाळाजी विश्वनाथाने कर्ज काढून फौज बनविली. शाहूराजांनी सेनापति पदावरून चंद्रसेनास काढल्यावर पुढे त्याचा भाऊ संताजी यास नेमले. नंतर सन १७१२ मध्ये मानसिंग मोरे यास सेनापती नेमले व त्याचे दिमतीस आपल्या भरवशाचा अंबाजीपंत यास नेमले. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर दि. १७ एप्रिल १७२० रोजी बाजीरावास छ. शाहू महाराजांकडून पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्याच वेळी अंबाजीपंत पुरंदरे यांना मुतालिकीची वस्त्रे करून दिली. पुरंदरे मुतालिक म्हणून साताऱ्यास शाहूमहाराजांजवळ राहत असत. अंबाजीपंत, त्यांचा मुलगा.
     महादेव, मल्हार तुकदेव ऊर्फ दादा, त्र्यंबक सदाशिव ऊर्फ नाना हे शाहू महाराजांजवळ राहून पेशव्यांची बाजू सांभाळीत. सन १७३७ मध्ये अंबाजीपंत, पिलाजी जाधव व राणोजी भोसले आणि आनंदराव पवार यांनी माळव्यात मोठी स्वारी करून दयाबहादुराशी कित्येक संग्राम व व्यवहार केले. कोल्हापूरकर संभाजीराजे यांच्या व शाहू महाराज यांच्या भेटीच्या प्रसंगी जाखणवाडी गावच्या मैदानात अंबाजीपंत होते (१७३१). उमाबाई दाभाडे यांच्या भेटीसाठी शाहू महाराजांनी काही महत्त्वाची मंडळी पाठवली होती. त्यांत अंबाजीपंत होते.
    बाजीराव पेशव्यांशी अधिकारवाणीने अंबाजीपंत बोलत असत. तरीसुद्धा त्यात आदब राखत असत. पेशवे लहान असले तरी अंबाजीपंतांस पत्रातून ‘चिरंजीव असे संबोधत असत. बाळाजी ऊर्फ नानासाहेब यांना जेव्हा दमाजी गायकवाडाने पकडले त्या वेळी अंबाजीपंतांनी त्यांना दंड भरून सोडविले. बाजीरावविरुद्ध कारस्थाने करणारी सरदारांना पत्रे लिहून त्यांचा बंदोबस्त केला. अंबाजीपंत पेशव्यांचे कारभारी व उपमंत्रीच होते. त्यांचा मृत्यू भाद्रपद शु।८ शके १६५६ (सन १७३५) ला माहुली येथे झाला. त्यांच्या सौभाग्यवती बयाबाई यांनी सहगमन केले. महादोबा व सदाशिव हे त्यांचे पुत्र. पानिपतच्या युद्धात बाबा पुरंदरे होते. त्यांना ग्वाल्हेरच्या दरम्यान व्यवस्थेसाठी मागे ठेवले होते. महादोबा पुरंदरे हे नानासाहेबांच्या वेळी एक अत्यंत सज्जन व पेशव्यांच्या गुरुस्थानासारखे होते. मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत कर्तृत्ववान व निष्ठावंत अशी बहुमोलाची माणसे या घराण्याने दिली.




























हे फोटो पब्लिक करु नये
पुरंदरे वाड्याचा ब्रिटीशकालीन फोटो
पुरंदरे वाड्यातील गणेश मंदीराचे ब्रिटीशकालीन फोटो









 या सरदार पुरंदरेंचा वाडा आज सासवडमध्ये भग्नावस्थेत उभा आहे. वाडा पडण्याच्या बेतात असल्यामुळे इथे सध्या पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे. सासवड एस. टी. स्टँडपासून केवळ दहा मिनीटाच्या अंतरावर हा वाडा आहे. वाडयाभोवती तटबंदी दिसते. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला सरदार अंबाजीपंत पुरंदरे यांनी बांधलेले गणपती मंदीर दिसते. त्याला बाहेरुन प्रवेश दिला आहे, ज्यामुळे भाविक सहजपणे मंदीरात जाउ शकतील. वाड्याच्या तटबंदीत बुरुज आहेत, तसेच दरवाज्यावर लोखंडी खिळे पहायला मिळतात. दरवाज्याच्या वर बंदुकीसाठी जंग्या आहेत, तसेच बाहेर उभ्या असलेल्या शत्रुच्या अंगावर तेल ओतायची व्यवस्था आहे. दरवाज्यातून आपण मुख्य चौकात प्रवेश करतो. इथे भग्न असलेल्या वाड्याचे सौंदर्य आणि भव्यता आपल्याला जाणवते. चौकात पुष्करणी आहे.
   वाड्याच्या तळमजल्यावर काही जागा बाहेरच्या लोकांसाठी खुल्या आहेत तर काही खोल्या खाजगी वापरासाठीच आहेत. वाड्याच्या भिंती जाड असून त्यात दिवे ठेवण्यासाठी देवळ्या आहेत तर वस्तु ठेवण्यासाठी फडताळे आहेत. स्वयंपाकघरात अन्न ताजे रहावे म्हणून पुरेशी प्रकाश आणि वायुविजनाची व्यवस्था केलेली दिसते. वरच्या मजल्यावर नेणारे जीने भिंतीमध्ये आहेत. भिंतीना चुना लावला आहे, त्यावर नंतर रंगकाम केलेले दिसते. वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार लाकडाचे आणि कोरीवकाम केलेले आहे. पहिल्या मजल्यावर असलेल्या नृत्य दरबाराच्या जागेत हंड्या आणि पडदे लावायची सोय केलेली आहे. इथे नर्तिकेंसाठी मंच आहे, भित्तीचित्रे रंगवलेली आहेत, तसेच जमिनीवर सारिपाटाचा खेळ कोरला आहे. बाकीच्या खोल्या रिकाम्या आहेत.
दुसर्या मजल्यावर पीठ दळण्यासाठी खोली आहे. अर्थातच या खोलीला खिडक्या फार नाहीत, अर्थातच खाजगीपणा राखणे हाच हेतू होता. इथून आपण थेट गच्चीवर जाउ शकतो. इथून एक व्हरांड्यातून आपण सर्वत्र जाउ शकतो. अर्थातच दगडी भिंतीने हा बंदीस्त आहे. अर्थात अनेक ठिकाणी पडझड झालेली असल्यामुळे जपून चालावे लागते. गच्चीवरुन सभोवतालचा परिसर सुंदर दिसतो.
  वाड्याला तळघर देखील आहे. अर्थातच इथेही भिंती पडलेल्या आहेतच. स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे इथून एक भुयार थेट जाधवगढीत जाते जी जवळपास इथून सात कि.मी. दूर आहे. अर्थातच यात तथ्य नसावे. तळमजल्यावर असणार्या ओसरीचे खांब एका रेषेत बघणे हे त्याकाळच्या वास्तुशैलीची प्रगती दर्शवते. या वाड्यासाठी चपट्या आकाराच्या वीटा वापरल्या आहेत, ज्यांना 'पुस्तकी वीटा' म्हणतात.इथेच काही चित्रपटांचे जसे एक डाव भुताचा, तुंबाड यांचे शुटींगही झाले आहे.

सखाराम बोकील वाडा सासवड*
  सासवड नगरात हि वास्तू शोधणे म्हणजे थोडी भटकायची तयारी पाहिजे. अखेर श्रम पुर्णत्त्वास येतात आणि या अनेक जीर्ण  वास्तूंच्या राशीत इच्छित नेमक्या या वास्तूसमोर आपण पोहोचतो. हा भव्य असा वाडा २५० वर्षे ऊन, वारा, पाऊस सहन करीत आपला भव्यपणा मिरवीत अजून सर्वांगाला झालेल्या जखमा घेऊन एका शूर वीरासारखा उभा आहे.
         एका पडिक अवस्थेतील दरवाज्यातून आपण जेव्हा दुसऱ्या चौकात प्रवेश करतो तेव्हा तेथील भक्कम जोत्यांवर आपली नजर खिळते, दोन्ही मजले थोड्याफार अवस्थेत टिकून राहिलेले आहेत. आतील काष्ठशिल्पचे काम पाहून मन प्रसन्न होते. उत्तम लाकूड आणि कलावंतांचा प्रतिभासंपन्न कलाविष्कार आपण पाहतो पुढच्या चौकात मात्र इमारतीच्या किरकोळ खुणा दिसतात. पेशवाईतील प्रसिध्द पुरुष 'सखाराम बापू बोकिल' यांचा वाडा असावा. परत आपण फिरतो, वाड्याच्या पायऱ्या उतरतो आणि पुन्हा दरवाज्याकडे पाहतो. दरवाजातील काष्ठशिल्पे आणि श्री. गजानन नजरेस भरतो  आणि मग या वाड्याप्रमाणेच सखाराम बापू बोकिल यांचे चरित्र डोळ्यापुढे उभे राहते.
याशिवाय सासवडमध्ये आणखी काही वाडे आहेत.
कुंजीर वाडा

  • Shreeram mandir Purandare Ramabaug


  • संदर्भ -महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे भाग-२
    आपलाच युवा मित्र
    संकेत किसन देशपांडे
    ९१५६७९४०५३
    संत सोपानदेव संजीवन समाधी

    संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर (सासवड) :-

    सासवडच्या पश्चिम दिशेस चांबळी नदीच्या पावनतीरी हे पुण्य पवित्र सोपानदेव मंदिर उभे आहे. मंदिर उंचावर असून पुढच्या बाजूने दगडी बांधकाम करून विस्तृत चौथरा बनवला आहे. यावर जाण्यास दोनही बाजूने जुन्या पध्दतीच्या उंच पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून आल्यावर महादेवाचे ‘नागेश्वर मंदिर’ दिसते. हे नागेश्वर मंदिर संत सोपान देवांच्या आधीचे आहे. नागेश्वर मंदिराची गाभारा व सभामंडप अशी रचना असून पूर्ण बांधकाम दगडी आहे तसेच समोरील पटांगणात नंदी आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूस सोपान देवांनी समाधी घेतली.
        मंदिराच्या बाजूने पुढे आल्यावर उजव्या हाताला मुख्य सभामंडप आहे. या मंडपात मध्यभागी भव्य अशी वीर मारुतीची मूर्ती आहे. अनेक लाकडी खांबावर हा मंडप उभा असून यातले सहा लाकडी खांब कलाकुसरीने भरलेले आहेत. याच मंडपात रोजचे प्रवचन व विशेष दिवशी कीर्तनाचे कार्यक्रम होतात. इथेच विणेकरी वीणा घेवून उभे असतात. या सभामंडपाच्या पुढेच दगडी मंडप आहे. दगडी मंडपातून आत गेल्यावर डावीकडे राम लक्ष्मण व उजवीकडे विठ्ठल रखुमाई आहेत. या मंडपातून दोन्ही देवांच्या मधून गाभाऱ्यात प्रवेश करता येतो.
    गाभाऱ्यात संत सोपानदेवांची समाधी आहे. काळ्या पाषाणातील समाधी पायऱ्यांची आहे. सकाळी नित्य पूजेनंतर समाधीवर मुखवटा ठेवला जातो.समाधीच्या मागील बाजूस मुरलीधर कृष्णाची मूर्ती आहे .
      संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे बंधू यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके ११९९ (ईस १२७७) मध्ये झाला. भगवदगीतेवर त्यांनी साररूप ओवीबद्ध टीका ” सोपानदेवी ” या नावाने लिहिली. वयाचे १९ वे वर्षी त्यांनी मार्गशीर्ष वद्य तृतीया शके १२१८ ( ईस १२९६) साली त्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली, समाधीच्या दक्षिण भागी एक विस्तीर्ण असा जुना चिंचेचा वृक्ष असून तिथे सोपानदेवाच्या पादुका आहेत. तेथून समाधिस्थळी सोपानमहाराजांनी प्रवेश केल्याचे सांगतात.
    जेष्ठ वद्य द्वादशीला ला संत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होते. प्रस्थान म्हणजे पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघते.
    माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

      भैरवनाथ मंदीर :-

    सासवडमध्ये असलेले हे मंदीर बाहेरुन बघून अंदाज येत नाही, पण तरीही एका गोष्टीसाठी या मंदीरात आवर्जून जावे.
    IMG-20191216-WA0130
    बाहेरुन हे मंदीर आधुनिक दिसते, पण भैरवनाथ देऊळ नक्कीच बघावे.
     DSC01383
    आत शिरताच वरती एक जुनी मोठी घंटा आहे. तिला बघताच तिच्यावर कोरलेले ‘DOMINIC’ ही अक्षरे लगेच दिसतात यावरुन ही तर पोर्तुगीज घंटा आहे याची खात्री पटते. अशा अनेक घंटा चिमाजी अप्पांनी वसईची लढाई जिंकून तिथल्या चर्च मधून विजयाचे प्रतीक म्हणून इथे महाराष्ट्रात आणल्या आणि जागोजागी आता त्या देऊळात भूषण म्हणून दिसतात
    20191215_173548

    DSC01385
    घंटेच्या पुढे, वरती, एक सुंदर झुंबर व काचेचे पुरातन दिवे दिसतात.
     
     पोखरची लेणी
    सासवडच्या प्राचीनत्वाचा एक अस्सल पुरावा म्हणजे या परिसरात असलेली लेणी, 'पोखर लेणी'.पुरंदर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी उत्तरेला सासवडच्या दक्षिण-पूर्वेस ९ किमी अंतरावर पोखर गुहा आहेत. पोखर, सासवड जवळील नारायणपूर पासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेले हे गाव! गावातील शाळेसमोरच्या एका छोट्या डोंगरावर ही लेणी वसली आहेत. शाळेसमोरील रस्त्याने डोंगराकडे वाटचाल सुरु करायची.  दूरवरून पाहताना इथे लेणी आहेत अशी शंका सुद्धा येत नाही.

    डोंगर चढायला अगदी सोपा.. ५-१० मिनिटात आपण चढून लेण्यांजवळ येतो.

    छोट्याशा डोंगरात पोखरलेली ही लेणी. दुमजली.


    खालच्या गुहेचे दोन भाग. आतला भाग गाभाऱ्या सारखा.

    तिथेच ही मूर्ती दृष्टीस पडते. कोणीतरी कोरण्याचा प्रयत्न केला पण काही कारणाने ते पूर्णत्वास गेले नाही. शेंदूर अर्चित आणि मूर्तीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने तिची ओळख पटणे  खरोखरच कठीण. फक्त कयास बांधला जाऊ शकतो. मूर्तीकडे निरखून पाहिल्यास तीन मुख असणारी मूर्ती कोरण्याचा प्रयत्न केला आहे असे लक्षात येते.




    घारापुरी येथील त्रिमूर्ती शिवरूप स्वरूप कोरण्याचा प्रयत्न केला आहे असे वाटते.श्री. क्षेत्र नारायणपूर जवळच असल्याने ही मूर्ती दत्तात्रेयाची सुध्दा असू शकते असा अंदाज मनात येतो. ह्या मूर्तीकडे तोंड केल्यास गाभाऱ्यातच उजवीकडे आणि डावीकडे काही प्रतिमा कोरलेल्या दिसतात. त्या नक्की काय आहेत ह्याचा अंदाज बांधणे अवघड आहे.

    उजवीकडील मूर्ती

    डावीकडील मूर्ती

    ह्या मूर्ती रचना पाहता त्या आठव्या ते नवव्या शतकातील असाव्या असा अंदाज आहे.

    वरच्या भागात चढायला किंचित कसरत करावी लागते. वरच्या भागात काही कोरीव कारागिरी नाही. शेंदूर अर्चित काही दगडी प्रतिमा आहेत.

    लेणीस्थित डोंगरावरून पुरंदर आणि वज्रगडाचे दर्शन होते.

    ह्या लेण्याचा मागोवा घेतल्यास काही माहिती मिळू शकते का हे पाहणे महत्वाचे आहे.कदाचित खडकात असलेल्या दोषामुळे लेणी कोरणे सोडून दिले असावे.लेणी स्थापत्यशास्त्रादृष्ट्या महत्वाचा पुरावा असा कोणताही शिलालेख नसल्यामुळे याची काल ठरवणे अवघड आहे. लेणी मात्र अचंबित करणारी आहेत. कोणी बांधली, का बांधली, कशाची मूर्ती कोरण्याचा हेतू होता, का अपूर्ण राहिला..इ. प्रश्न लेणी पाहल्यावर समोर येतात.ह्या प्रश्नांना मनात घोळवतच डोंगर उतरायचा

    श्री लवथळेश्वर मंदिर :-

    श्री समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' आरती रचिली होती .जेजुरी गावठाणा पासून एक किलोमीटर अंतरावर असलेले लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे जागृत स्थान असे मानले जाते. या मंदिराविषयी काही कथा सांगितल्या जातात ,या स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महत्म्य सांगितले आहे,
        लवथळेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचे जागृत स्थान असे मानले जाते. या स्थानाविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये महत्म्य सांगितले आहे, दुर्वास ऋषींचा लवा नामक शिष्य होता त्याला स्वतःला आपल्या तप साधनेमध्ये व्यत्यय येवू नये असे वाटत होते, ही बाब त्यांनी आपल्या गुरूच्या कानी घातल्यानंतर, दुर्वास ऋषींनी शिष्याच्या तपश्चर्येसाठी हा परिसर दानव-शाकिनी-डाकिनी-भूत-पिशाच्च यांच्या संचारापासून अभिमंत्रित करून मुक्त केला, तोच हा लवथळेश्वर परिसर. पुढे कृतयुगामध्ये मणीचूल पर्वतावरील सप्तऋषींना मणीमल्ल दैत्यांपासून आपली कुटुंबे सुरक्षित ठेवण्यासाठी नारद मुनींनी याच परिसरामध्ये धेवण्याचे सुचविले. समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' ही आरती स्फुरल्याचे सांगितले जाते
        मात्र बहुतेक लोकांना इथे अश्या प्रकारचे मंदिर आहे का ? हेच माहित नाही.आपण मंदिराविषयी जो अंदाज बांधतो कि , २० एक फुट उंच कळस , फडकणारा भगवा वैगरे वैगरे परतू इथे असे काही दिसत नाही एका मोठ्या पडलेल्या वादाच्या झाडाजवळ हे मंदिर आहे , 
    12438697_1011753785532944_586151220_o.jpg
        अर्थ वर्तुळ कमानीवर "श्री श्री लवथळेश्वर मंदिर " असलेले फलक आहे , मंदिर जमिनीपासून खाली आतमध्ये असल्याने बाहेरून सहजपणे लक्षात येत नाही.
    12436617_1011754312199558_745292244_o.jpg
    .जमिनीशी समांतर असलेले हे मंदिर , प्रथमदर्शी मंदिराची कोणत्याही खाणाखुणा जाणवत नाहीत . जमिनीत कोरलेल्या पायर्या, 
    मंदिरामध्ये उतरण्यासाठी पूर्वेकडीलबाजूने पाच सहा पाय-या आहेत त्यांच्या उजव्या अंगावर एक अस्पष्ट सात ओळींचा शिलालेख दिसतो, त्यावर शके १५३० हे साल दिले आहे. मूळ मंदिर उत्तराभिमुख आहे प्रवेश द्वाराबाहेर कोनाड्यांमध्ये देव देवतांच्या मूर्ती आढळतात.
    12449339_1011754628866193_565398932_o.jpg
    आधी उजवीकडे मग डावीकडे वळून मंदिराच्या गाभार्यात आपण प्रवेश करतो , 
    12399268_1011755705532752_624399731_n_0.jpg12399410_1011756338866022_2145235080_n_0.jpg
    भिंतीवर विष्णूमूर्ती ,हनुमान शिल्प पाहता येते , 
    12435823_1011135275594795_384765574_n.jpg
    आत प्रवेश केल्यावर रंग मारलेला मोठ्ठा नंदी दिसतो , 
    12421644_1011762365532086_1608202890_n_0.jpg
    त्या मागेच गणेश मूर्ती आणि नागमूर्ती आहे .त्याच्या शेजारीच पश्चिमेकडे एक दरवाजा असून तो 'लवतीर्थ' मध्ये जाण्या चा मार्ग आहे. गणपतीच्या समोरच पाठमोरा मोठा नंदी आहे.  
    12443405_1011756772199312_1000536725_o.jpg
    नंदी समोर अडीच एक फुट गर्भगृहेत दरवाज्याच्या पलीकडे जमिनीच्या पातळीखाली "शिवशंकराचे " दर्शन होते .मुख्य गर्भगृह दोन ते तीनच लोक मावू शकतील एवढे अतिशय छोटे असून तेथे लवा ऋषींनी स्थापित केलेले सुंदर शिवलिंग आहे. मुळपिंड तसेच ठेऊन सर्वत्र " टाईल्स " लावल्या आहेत. 

        










    सरलष्कर दरेकर वाडे - आंबळे ता.पुरंदर

       महाराष्ट्रात वाडे व गढीकोट यांची संख्या हजारोच्या घरात आहे. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. तसेच बरेचसे गढीमालक इतरत्र स्थलांतरीत झाल्याने काही गढ्या ओस पडुन उध्वस्त झाल्या आहेत. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आंबळे गावात असलेली सरलष्कर दरेकर यांची गढी त्यापैकी एक पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील दरेकर गढी पुण्यापासुन सासवडमार्गे ४८ किमी अंतरावर असुन सासवड आंबळे हे अंतर १६ किमी आहे पेशवाईत घोडदळाचे सेनापती खंडेराव दरेकर यांचे वतन असलेले भरभराटीस आलेले हे गाव आजही त्याच्या अंगाखांद्यावर गतकाळाच्या वैभवशाली खुणा बाळगुन आहे...

       मुळात आंबळे गाव एका कोटात वसलेले असुन कधी काळी या संपुर्ण गावाला तटबंदी व बुरुज असल्याच्या खुणा जागोजाग दिसुन येतात या नगरकोटाच्या तट बंदीच्या आतच पेशव्यांचे घोडदळाचे सेनापती खंडेराव दरेकर यांचा वाडा व इतर काही वाडे होते आंबळे गावात फेरी मारताना आजही पडीक अवस्थेत असलेले हे वाडे मोठया प्रमाणात दिसुन येतात गावात प्रवेश करणारा रस्ता या कोटाच्या उध्वस्त दरवाजातुनच आत शिरतो बारकाईने पाहिल्यास आजही या कोटाच्या दरवाजाची कमान व त्या शेजारील दोन ढासळलेले बुरुज आजही पहायला मिळतात रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेल्या उध्वस्त दगडी तटबंदीच्या प्रांगणात दोन पेशवेकालीन मंदिरे पहायला मिळतात यातील राजराजेश्वर मंदिर म्हणुन ओळखले जाणारे शिवमंदीर पूर्वाभिमुख असुन सभामंडप व गर्भगृह अशी याची रचना आहे मंदिराचा मंडप नक्षीकामाने नटलेला असुन कोरीव कामावरून हे मंदिर पेशवे काळातील असल्याचे जाणवते यातील दुसरे मंदिर रामाचे आहे गावात शिरण्यापुर्वी अलीकडेच रस्त्याच्या उजव्या बाजुला एक भलीमोठी दगडात बांधलेली बारव दिसते या बारवचे पाणी आजही वापरात आहे या बारवच्या समोरच आपल्याला कोटाचा आजही कमानी सकट आजही सुस्थितीत असलेला कोटाचा दुसरा दरवाजा व मोठया प्रमाणात घडीव दगडांची तटबंदी दिसुन येते गावात शिरल्यावर सर्वप्रथम हनुमानाचे मंदिर असुन या मंदीरासमोर पेशवाईतील सरलष्कर खंडेराव दरेकर यांचा वाडा आहे.  पूर्वेस उताराच्या रस्त्यावर अगदी जवळच समोरासमोर दक्षिण व उत्तरेस भव्य मुख्य प्रवेशद्वारे असलेले दोन सरदार दरेकरांचे वाडे दृष्टीस पडतात. दक्षिणाभिमुख वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला दुमजली कोरीव तीन दगडी कमानी असणारी तत्कालीन वास्तू आपले लक्ष वेधून घेते तर तिच्या समोरील सरदार दरेकरांचा भव्य व दुरूस्तीसह रंगरंगोटी केलेला वाडा गतकालीन वैभवाची साक्ष देण्यास पुरेसा आहे.आंबळे गावात प्रवेश करताना उजव्या बाजूला या वाड्याचा भाला मोठा बुरूज दिसून येतो. वाड्याचा मुख्य दरवाजा दिल्ली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. वाडयाच्या या दरवाजाशेजारी दोन बुरुज असुन समोरील बाजुस नगारखाना व दुसरा वाडा आहे. गढीचा परीसर साधारण तीन एकरचा असुन गढीचे बुरुज व तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहेत. गावात फेरी मारताना आपल्याला इतरही काही वाडे पहायला मिळतात. गावात भैरवनाथाचे म्हणजे शंकराचे अजुन एक मंदिर असुन या मंदिराला देखील तटबंदी आहे. पेशवाईतले घोडदळाचे सरसेनापती खंडेराव दरेकर यांच्यामुळे आंबळे गावाला एक ओळख आहे. आंबळे गावच्या पाठीमागे असलेल्या ढवळगडवर जाण्यासाठी आंबळे गावातुन रस्ता जातो. दरेकर यांच्या भोसरे येथील खटाव शाखेच्या इनामदार लहुराज दरेकर या वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार दरेकर हे मोरे या ९६ कुळाचे उपकुळ आहे...

         शिवकाळात सामान्यातून असामान्य कर्तृत्व करणारी अनेक घराणी छत्रपतिंच्या प्रेरणेने स्वराज्य स्थापनेत सहभागी होऊन इतिहासात गौरवाने वर्णिली गेली आहेत. क-हेपठारावरील अनेक घराण्याप्रमाणे दरेकर घराणे हे छत्रपतिच्या लष्कराचा महत्त्वाचा घटक होते. मुळ सातारा येथील जावळी भागातील दारे गावचे ते दरेकर किंवा दऱ्याखोऱ्यातील वीर ते दरेकर म्हणुन ओळखले जातात शिवकाळात हिरोजी, गणोजी हे पायदळाचे असामी म्हणून मराठा सैन्यात होते त्यांचे वारस सुभानजी, गोरखोजी, मानाजी, गौरोजी यांना अनेक गावचे मोकासे होते मराठयांमधील मोठ्या इनामदारांमध्ये दरेकर अग्रणी होते. यांचा पराक्रम उभारून आला तो पेशवेकाळात. हे गणोजी दरेकर, येसाजी दरेकर व बाळाजीराव दरेकर या सरदारांच्या नावाचा उल्लेखाने प्रमाणित होते. छत्रपति शाहू महाराजांच्या कालखंडात दरेकर लष्कराचा घटक असल्याचे उल्लेख आढळून येतो. छ.शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली थोरले बाजीराव पेशवे व नानासाहेब पेशवे यांच्या कारकीर्दीत अनेक पराक्रमी व्यक्तिमत्त्व उदयास आली. राणोजी शिंदे, सुभेदार मल्हारराव व इतरहि बहुसंख्य पराक्रमी सरदार निर्माण झाले तर सरदार दरेकरांना नावलौकिक मिळाला तो हा कालखंड होय.  आंबळे हे गाव छत्रपती शाहुराजे यांनी सुभानजी दरेकर यांना लष्कर खर्चासाठी इनाम दिले यांचे वंशात खंडेराव दरेकर सरलष्कर झाले त्यांनी माधवराव पेशवेंचा पिसाळलेल्या हत्तीपासून जीव वाचवला पेशवे काळात पानिपत, खर्डा, उदगीर, राक्षसभुवन, कर्नाटक, खानदेश येथे झालेल्या मराठ्यांच्या लढायात प्रमुख सरदारा मध्ये दरेकर यांचा समावेश होतो शनिवार वाड्याजवळ आजही दरेकरांचा वाडा आहे 

    विशेषतः इ.स.१७५७ च्या सप्टेंबरमधे मराठ्यांनी कर्नाटकातील कडाप्पाचा नवाब अब्दुल मजीदखान मायणा याच्या ताबेदारीत असलेल्या कोलार, होसकोट व बाळापूर हल्ला केला तेव्हा सरदार इंद्रोजी कदम, सोनजी भापकर यांच्याबरोबर असलेल्या खंडेराव दरेकर यांनी पराक्रम करून विशेष प्रसिद्धी प्राप्त केली. पेशवे नारायणराव यांची शनिवारवाड्यात हत्येनंतर सरलष्कर खंडेराव दरेकरांनी राघोबादादांचा पक्ष सोडून बारभाई पक्षास सामील झाले.खंडेराव दरेकरांना सरलष्कर ही पदवी पेशवाईत मिळाली होती तर त्यांचे आजोबा दादाजी दरेकरांनी पानिपत युद्धात देह ठेवला होता. इ.स.१७९४ मध्ये दसऱ्याच्या सीमोल्लंघना वरून परत आल्यावर शनिवार वाड्यातल्या दरबार महालात पेशव्यांनी रुपये ८२७ एवढ्या किंमतीची मानाची वस्त्रे हणमंतराव दरेकर यांना दिल्याची नोंद आढळते...सरलष्कर दरेकरांकडे इ.स.१७९५ साली पुणे प्रांतातील आंबळे हा गाव इनाम होता तर बीडव पाथरीचे चौथाई अंमल होता. बारामती तालुक्यातील जळगाव, उंडवडी व पुरंदर तालुक्यातील नायगाव ह्या तीन गावांचा मोकासा होता. १७९५ साली दरेकरांकडे एकूण १ लाख १६ हजार ८५ रुपयेचा संरजाम असल्याचा उल्लेख आढळून येतो. याच वर्षी मराठे व निजाम यांच्यामधे खर्डा येथे झालेल्या लढाईत सरलष्कर खंडेराव पुत्र हणमंतराव दरेकरांनी तरवार गाजविल्याची नोंद आढळून येते. 

    सरलष्कर खंडेराव दरेकर यांचा शिक्का खालीलप्रमाणे  

                                    श्री  

                              चरणी तत्पर

                         जयाजीसूत खंडेराव 

                           दरेकर सरलष्कर  

    त्यामुळे या भागातील लोकांच्या बोलण्यात कधीतरी हमखास येणार वाक्य म्हणजे," अमुक तमुक काय स्वतःला आंबळेचा जहागीरदार समजतोय का ?"

        इतिहास समजुन घेतल्यावर वाड्याची सैर करुया.डागडुजी केलेल्या वाड्याला मुख्य दरवाजा जरी उत्तरेला असला तरी त्याच वाड्याला पूर्वेकडील तटबंदीत एक भला दरवाजा आहे. समोरच्या मोकळ्या जागेत हिरवळ व विविध रंगीबेरंगी फुलझाडे आकर्षक रचनेत लावलेली दिसतात. मोकळ्या पटांगणातून पूर्वेकडील दरवाजाने आत प्रवेश केला कि दगडी बांधकामातील चौकात आपण येतो. या चौकात उत्तरेचा भाग सोडून तीनहि बाजूंनी सोप्याची आकर्षक इमारत लक्ष वेधून घेते. दक्षिणेस जाणारा भुयारी मार्ग लोखंडी जाळीच्या दरवाजाने बंद केल्याचे आढळून येते दक्षिणेच्या सोप्यातील दालनात दिवाणखाना आहे. उच्च अभिरुचीची बैठक व्यवस्था व घराण्यातील कर्तबगार व्यक्तीच्या तसबीरी व ढाल तरवार भिंतीवर लावलेल्या दिसतात. मग आपण पहिल्या चौक व दुसरा चौक यांच्या दरम्यान असलेल्या भागातून पहिल्या चौकात पोहोचतो. हा चौक आयताकृती असून मुख्य प्रवेशद्वाराचा आतील भाग पाहता येतो. तीन फूटांच्या उंचीचा घडीव दगडी बांधकामातील चौक तत्कालीन वैभवाची मूकपणे साक्ष देतो. मुख्य दरवाजेच्या आतील बाजूस दरवाजाचे आतील असणाऱ्या देवड्या व त्याच्याशेजारी असलेल्या घडीव दगडी बांधकामातील पूर्वेस व पश्चिमेस असलेल्या भुयारी मार्गाचे उतरते जीने दिसतात. पूर्वेकडील भुयारी मार्ग हा पूर्वेकडील असलेल्या श्रीराम मंदिराकडे व पश्चिमेकडील भुयारी मार्ग हा ग्रामदैवताकडे जात असावा हा माझा अंदाज आहे. मग आपण मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेल्या बुरूजावर दगडी जीन्याच्या पायरी मार्गाने पोहोचतो.  

       मग पुन्हा खाली उतरून आल्या मार्गाने म्हणजेच पूर्वेकडील दरवाजाने बाहेर पडावे. पूर्वेकडील रस्त्याच्या पलिकडे पडझड झालेल्या मोठ्या आकाराच्या तटबंदीत सुरेख पूर्वाभिमुख मंदिरे आहेत. या परिसराच्या दक्षिणेस दोन लहानमोठ्या घडीव दगडी बांधकामातील पाण्याने भरलेल्या बारवा आहेत. मोठ्या बारवेत उतरण्याठी पश्चिमेकडून पायऱ्या आहेत परंतु वापरात नसल्यामुळे आसपास गवत व झुडुपे वाढलेली आहेत. बारवा पाहून आम्ही मंदिराजवळ यावे. पेशवाई कालखंडात दगडी बांधकामातील श्री राम मंदिर व तुळजा भवानीचे अप्रतिम मंदिर आहे. मंदिराचे शिखर भाजक्या वीटांचे केलेले आहे. श्रीराम मंदिरात राम, लक्ष्मण व सीतामाईच्या सुबक मूर्ती स्थानापन्न असून ह्या सर्व मूर्ती बखतराम नावाच्या राजस्थानी व्यक्तिने तयार करून पेशव्यांना दिलेल्या होत्या, त्या पेशव्यांनी सरलष्कर दरेकरांना भेट दिलेल्या आहेत. याच मंदिराच्या पिछाडीस थोरल्या वाड्यातून भुयारी मार्ग येतो असे म्हणतात. मंदिराच्या पाठीमागील जेथे भुयारी मार्ग येते तेथे तळघर असून तेथे ध्यान मंदिर असल्याची माहिती मिळते. या तळघराला लागूनच पश्चिमेस चौकोनी विहीर आहे ती आपणांस दिसून येते. मंदिर परिसरातील पडझड झालेल्या पूर्व - पश्चिम तटबंदीत दोन भव्य दगडी बांधकामातील प्रवेशद्वारे अस्तित्वात आहेत. श्रीराम मंदिराच्या पूर्वेस लहान पण सुरेख हनुमान मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या पूर्वेस अतिशय प्रेक्षणीय श्री राजेश्वर शंभू महादेव मंदिर आहे. मंदिर सभागृह व गर्भगृह स्वरूपात असून सभामंडपात तीन कलाकुसर केलेल्या दगडी कमानीत आहे. पेशवेकालीन स्थापत्यकलेने ओतप्रोत असलेले दगडी स्तंभ तत्कालीन उच्च अभिरुचीची जाणीव करुन देतात. दक्षिण व उत्तरेच्या भिंतीत दोन्हीहि बाजूच्या कोनाड्यात श्री गणपति मूर्ती आहेत. तर गर्भगृहालगत असलेल्या दोन्ही कोनाड्यात उत्तरेस पन्हळी असलेल्या शिवपिंडी आहेत. गर्भगृह काहीसे खोलट असून शिवलिंग स्थापित केलेले असून पाठीमागील दोन कोनाड्या दोन अप्रतिम परंतु अपरिचित मूर्ती आहेत.या मंदिराचे शिखर भाजक्या वीटांमधे गोपुर पद्धतीने बांधलेले आहे. या मंदिर समुहास देऊळवाडा या नावाने संबोधले जाते. 

        मग आपण पुन्हा ग्रामदैवताजवळ पोहोचावे व तेथून उत्तरेच्या गावातील रस्त्याने गेल्यावर पूर्वाभिमुख वाड्याचे प्रवेशद्वार व थोडीशी तटबंदी पडझड झालेली दिसून येते तर समोरील बाजूस दगडी बांधकामातील बारव दिसून येते. गावातून बाहेर पडताना ऐतिहासिक बांधकामाच्या खूणा दर्शविणारे अनेक अवशेष दिसतात.   












     चतुर्मुख मंदिर (गराडे) - सासवड - नोव्हेंबर २०१९

    सासवडमधून वाहणार्या कऱ्हा नदीचे उगमस्थान हे दरेवाडी जवळ आहे .इथे चतुर्मुख मंदिर आहे.त्याची आणि कऱ्हा नदीच्या उगमाची कथा अशी आहे.
         “हे ठिकाण ब्रम्हदेवांची तपोभूमी होती. या ठिकाणी ब्रम्हदेव तप करत असताना पांडेश्वर येथे यज्ञ करीत असलेल्या पांडवांना गंगाजलाची आवश्यकता होती तेव्हा त्यांनी गंगाजलासाठी ब्रम्हदेवाचा कमंडलू लवंडला व त्या जलप्रवाहा मधून कऱ्हा व चर्मण्वती या नद्या उगम पावल्या. मंदिराच्या उत्तर बाजूने चर्मण्वती व दक्षिण बाजूने कऱ्हा नदी वाहत जाते. कर्हे चा वाहणारा प्रवाह दरेवाडी येथून दिसू लागतो येथे काठावर कऱ्हामाईचे छोटे मंदिर आहे.”
    या दोनही नद्यांचा संगम सासवड येथे होतो. त्या संगमावर संगमेश्वर महादेवाचे मंदिर आहे.
    गराडे गावाजवळील दरेवाडी जवळ साधारण २ किमी अंतरावर एका उंच डोंगरावर हे मंदिर आहे. पावसाळ्यात हा परिसर निसर्गरम्य अतिशय सुंदर दिसतो. पूर्वीच्या छोट्या पूर्वाभिमुख मंदिरास नव्याने मंडप बांधला आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे. मंदिर परिसरात काही नवीन मंदिरे बांधली आहे.
    या मंदिराकडे जाण्यासाठी पुण्यातून दोन मार्ग आहेत.
    पहिला मार्ग पुणे-सातारा रोडवरून खेड शिवापूर-सासवड रस्त्याने पुढे गराडे गावाच्या आधी डाव्या बाजूच्या रस्त्याने वारवडी गावाकडे जाण्याचा रस्ता - त्या पुढे दरेवाडी तेथून पुढे लहानसा घाट सुरु होतो. हा रस्ता मंदिरा पर्यंत चांगला आहे.
        दुसरा मार्ग पुण्यातून बोपदेव घाट मार्ग सासवड जातांना बोपदेव घाट उतरल्यावर पुरंदर धाब्याच्या पुढे उजव्या बाजूचा पठारवाडी चा रस्ता पकडावा तोच पुढे घाट चढून चतुर्मुख मंदिराकडे जातो. 
     

    सासवडजवळचे कोडित म्हस्कोबा मंदिर – पुणे आणि मुंबईजवळील ठिकाणे

    राजाराम सेतुरामन यांनी प्रकाशित केले 31 जुलै 2014· अद्यतनित1 सप्टेंबर 2014

    एके दिवशी, मला माझ्या ब्लॉगच्या एका 70-वर्षीय अनुयायाकडून या मंदिराची शिफारस करणारा ईमेल आला. त्यांनी मला महाराष्ट्र टाइम्समध्ये मंदिराविषयी एक लेखही पाठवला होता. ते मराठीत होते आणि मला ते पूर्णपणे समजले नाही. पण, छायाचित्रावर चांगले दिसणारे कोणतेही नवीन ठिकाण भेटीसाठी चांगले असते.

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    तांत्रिकदृष्ट्या 2014 च्या पावसाळ्यातील हा पहिला प्रवास होता. नेहमीच, हंगामातील पहिली सहल नेहमीच मंदिरात असते. आमच्याकडे पहिल्या सहलीसाठी सहसा मोठी गर्दी असते आणि सर्वात सुरक्षित भाजक म्हणजे मंदिर. पहिल्या सहलीनंतर अनेकजण हंगामासाठी निवृत्त होतात आणि तेव्हाच चालणे आणि ट्रेक सुरू होतात.

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    बालाजी नारायणपूर मंदिर फक्त 10 किमी अंतरावर आहे. कानिफनाथ मंदिरही जवळच आहे. बोपदेव घाटाच्या वाटेने गेलो, कानिफनाथ ओलांडलो, मग हिवरे नंतर उजवीकडे गेलो. सासवडहूनही येऊ शकता. मगरपट्टा शहरातून कोडित मंदिराच्या मार्गासाठी खालील नकाशा पहा.

    एकंदर रचना पाहता हे मंदिर बालाजी नारायणपूर मंदिरावर आधारित असल्याचे दिसते. मंदिराच्या भिंतींवर डझनभर पौराणिक कथा कोरलेल्या होत्या.

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    12.45 च्या सुमारास आम्ही तिथे पोहोचलो आणि मुख्य मंदिर बंद झाले. त्यांनी दुपारी एक वाजता ते उघडले. मंदिरात मोफत भोजनही देण्यात आले. ही मूर्ती तुम्हाला या भागात दिसणाऱ्या विशिष्ट शैलीची होती, एकच शरीरयष्टी, केशरी (सिंदूर?) विशाल डोळ्यांनी झाकलेली होती.

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

    मधुबन नावाचे एक रेस्टॉरंट आहे जे आपण या भागात असताना नेहमी भेट देतो. सासवडमार्गे परतताना आम्ही कधी कधी सासवडहून जेजुरीकडे जादा १० किमी चालवतो. आम्ही रात्रीच्या जेवणासाठी पुण्याहून सर्व मार्गाने गाडी चालवली आहे 🙂 हे ठिकाण अतिशय (अत्यंत) स्वच्छतापूर्ण आहे (त्यांचे स्वयंपाकघर पहा, तुम्हाला आश्चर्य वाटेल). त्यांचे महाराष्ट्रीयन पदार्थ (जे ते फक्त जेवणाच्या वेळी देतात) खूप चांगले आहेत. त्यांच्याकडे एक लहान लॉन देखील आहे जिथे मुलांनी काही वेळ धावत घालवला. मधुबनचा नकाशा खाली दिला आहे. ही एक चांगली सहल होती जी एका चांगल्या लंचमध्ये संपली!

    कोडित म्हस्कोबा मंदिर सासवड जवळ

     
     
     












     
     श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, कोडीत

    श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, कोडीत :-

       सासवड परिसर अतिशत निसर्गरम्य असा आहे,त्यात पुरंदर किल्ला आणि त्याच्या डोंगर रांगा, वाऱ्यावर डोलणारी पिके, हिरवीगार वृक्षराजी यामुळे हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. याच परिसरात श्री तुळाजीबुवा बडधे यांच्या भक्तीला पावून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज वीरहून कोडीतला आलेले आहेत. आज ज्या ठिकाणी मंदिर आहे. तेथील श्री जोगेश्वरीची ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या मुर्ती आहेत. येथे दर अमावस्येला श्रीनाथांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते. भक्तांना अन्नदान, भंडारा असतो.
      मंदिराच्या २ एकर १ गुंठे क्षेत्रफळापैकी ५०,००० चौरस फुटात मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णपणे दगडात बांधकाम केलेले आहे. शिखराची उंची ७१ फूट आहे. मुख्य मंदिरासमोर ४१ x ८१ फुटाचा सभामंडप असून सभामंडपासमोर १४ x १४ वाहन मंडप (नवसाई मंदिर) आहे. मंदिराचे प्रवेशद्वार – दिंडी दरवाजांची उंची ५१ फूट असून प्रवेशद्वारा खाली ३०,००,००० (तीस लाख) लीटर पाण्याची टाकी आहे.
           प्रवेशद्वाराला दांडेली सागवानाचा लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे. लाकडी दरवाजावर अतिशय सुंदर असे कोरीव काम केले आहे. मंदिराच्या सभोवताली २७० x २१ फूट आणि १७१ x २१ फूट अशा ओवार्याग बांधलेल्या आहेत. ओवारीसह संपुर्ण मंदिरावर अतिशय सुंदर – सुबक नक्षीकाम करून मूर्ती बसविण्यात आलेल्या आहे. मंदिराचे काम करताना भारतातल्या बर्याच मंदिर शैलींचा वापर केला आहे. उदा. सोमपुरा शैली, दाक्षिणात्य शैली, द्रवीडी शैली, हेमाडपंथी शैली,पेशवाई शैली इत्यादी.
       मंदिराचे संपूर्ण काम समस्त श्रीनाथ भक्तांच्या सहभागातून – ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारले आहे. श्रीनाथांवर अपार श्रद्धा असलेला समस्त श्रीनाथ भक्त, जर एकवटला तर तो काय करू शकतो हे पहायचे असेल तर आपणाला कोडितला यायलाच पाहिजे. कारण कोडित येथे साकारलेलं श्रीनाथांच भव्य-दिव्य मंदिर हे समस्त श्रीनाथ भक्तांच्या भावनांचे अपार श्रद्धेचे एक प्रतीक आहे. मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचा कार्यक्रम १ मे २००९ रोजी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.
        अत्यंत सुंदर देवस्थान, रविवार, गुरुवार, अमावस्या, पौर्णिमेला गर्दी असते, बाकी दिवशी शांततेत दर्शन.. भव्य मंदिर व परिसर.. निवांत वातावरण, चारी बाजूंनी पक्का मंडप..गावातील महिला गाभाऱ्यात जात नाहीत, पिढ्यानपिढ्या हा नियम पाळतात.. महिलांना तशी काही आडकाठी नाही.
          कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराला जाण्याचे दोन मार्ग आहेत पुणे – सासवड – कोडीत असा मार्ग आहे तसेच आपण पुणे – कापूरहोळ – केतकावळे – नारायणपूर – कोडीत या मार्गाने ही जाऊ शकता.

    हिवरे :-

         शिवकाळातील पंताजी गोपीनाथ व उत्तर पेशवाईतील पेशव्यांची कारभारी सखारामबापू भगवंत बोकील यांचे गाव म्हणजे हिवरे !  छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाची व प्रेरणादायी घटना म्हणजे प्रतापगडचा रणसंग्राम व त्यावेळी महाराजांचे वकील गोपीनाथपंत बोकील तर पेशवाईतील नामांकित साडेतीन शाहण्यापैकी एक असलेल्या सखारामबापू यांच्या चरणावती नदीच्या तीरावर काहीशा उंच ठिकाणी हिवरे गावची लोकवस्ती असून संपूर्ण गावाला असलेली तटबंदी/ कोटाची काळाच्या ओघात बरीच पडझड झालेली आहे. 
     
    हिवरे येथील चरणावती नदी तीरावर सखारामबापूंनी बांधलेले दगडी बांधकामातील प्रेक्षणीय त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होते. गावाच्या तटबंदीतील पूर्वाभिमुखी प्रवेशद्वार असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दगडी बांधकामातील बुरूज तत्कालीन वैभवाची साक्ष देते.

     बोकील कुटुंब हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगांव कुमठे येथील रहिवासी परंतु चौदाव्या शतकात यांचा मूळपुरूष सिध्देश्वरभट हे क-हेपठारावर येऊन राहू लागले व उपाध्यायाची वृत्ति चालवू लागले. अशा या सिध्देश्वरभटाचे पणतू गोपीनाथपंत बोकील यांचे बुद्धीकौशल्याचे कर्तृत्व अफजलखान प्रसंगी इतिहासाने पाहिले आहे. शिवकाळात सुरवातीचे सर्वात मोठे संकट म्हणजे सन १६५९ साली विजापूरच्या आदिलशाचा मातब्बर सरदार अफजलखानाचे होते, त्या प्रसंगी महाराजांचे निष्ठावान वकील म्हणून यशस्वी कामगिरी बजावणारे गोपीनाथपंत बोकील हे पुरंदर तालुक्यातील हिवरे या गावचे होते. गोपीनाथपंत हे सिध्देश्वरभट बोकीलांचे पणतू. त्यांच्यानंतर बोकील कुटुंबातील इतिहासात स्वकर्तृत्वाने प्रसिद्धीस आले ते सखारामबापू.  गोपीनाथपंत यांच्या यमाजी नामक भावाचे पणतू म्हणजेच सखारामबापू भगवंत बोकील. सासवड मधील बोकील यांचा पडझड झालेला वाडा पाहताना पेशवाईत प्रसिध्द असलेल्या साडेतीन शहाण्यापैकी एक असलेल्या सखाराम भगवंत या मुत्सद्याचा कालखंड डोळ्यासमोर उभा राहतो. हे सखारामबापू देखील हिवरे गावचे गावकुलकर्णी. त्यांनी हिवरे गावाच्या शेजारुन वाहणाऱ्या चरणावती नदीच्या तीरावर त्र्यंबकेश्वर मंदिराची निर्मिती केली होती, ते प्रेक्षणीय मंदिर आजही आपले वैभव सांभाळून दिमाखाने उभे आहे. अशा या कर्तृत्वान सखारामबापूंचा पेशव्यांशी पहिला संबंध आला तो प्रसंगही विलक्षण असाच होता. पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ हे सासवडला राहत होते. पेशवे आणि पुरंदरे या दोन घराण्यांचा स्नेह त्याकाळापासूनचा. दोन्ही घराण्यातील कर्तृत्वान पुरुषांनी स्वराज्याची निष्ठेने सेवा केलेली. बाजीराव बाळाजी पेशवे हे सुरूवातीला सासवडला राहत होते. बाजीराव साहेबांना भोजनात तीळाची चटणी फार प्रिय असायची हे महादजी पुरंदरेंना ज्ञात होते. परंतु एकदा ते जेवायला आले असताना त्यांच्या ताटात तीळाची चटणी नव्हती, ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यावेळी तेथे पंगतीला जेवण वाढणारा पुरंदरेचा शार्गीद असलेला पोरसवदा मुलगा होता, तो म्हणजे सखारामबापू बोकील. प्रसंग पाहून तो पेशव्यांना म्हणाला," सरकार आज आदित्यवार (रविवार)  आहे. या दिवशी तीळ, मधु, मांसाहार व स्त्री या गोष्टी वर्ज्य असतात. " हे बाणेदार उत्तर ऐकून बाजीराव पेशवे प्रसन्न झाले आणि सखारामबापूचा पेशवाईशी संबंध जोडला गेला. पेशव्यांनी त्यांना हिवरे गावचे कुलकर्ण्य दिले तर महादजी पुरंदरे यांनी कारकुनी पदावर त्यांना नेमले. पुढे शनिवारवाडा बांधकाम १० जानेवारी १७३० सुरू झाले तेव्हा सखारामबापूंनी वाड्याच्या कुलकर्णीपणाचे काम अतिशय चोखपणे केले आणि पेशव्यांची मर्जी संपादली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आपल्या बुद्धीकौसल्याने अतिशय वेगाने प्रगती केली. नानासाहेब पेशवे यांच्या अनेक मोहिमात ते एक महत्त्वाचे सरदार म्हणून आघाडीवर असायचे. रघुनाथरावदादांनी उत्तरेची मोहिम आखली तेव्हा त्यांच्या समवेत ते होते. इ. स. १७५४ मधे सुरजमल जाट याच्याकडून खंडणीसाठी त्याच्या कुंभेरच्या किल्ल्यास रघुनाथरावदादा पेशवे, मल्हारराव होळकर व जयाजी शिंदे यांच्या सैन्याने वेढा दिला. या दरम्यान तोफेचा एक गोळा लागून मल्हाररावांचे पुत्र खंडेराव मरण पावले. मल्हाररावांना आपल्या मुलाच्या मृत्यूने अतिशय शोक झाला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली, की " सुरजमलचा शिरच्छेद करून कुंभेरची माती यमुनेत टाकीन तरीच जन्मास आल्याचे सार्थक, नाही तर प्राणत्याग करीन." ही मल्हाररावांची प्रतिज्ञा सुरजमलच्या कानावर गेल्यावर तो घाबरला. त्याने आपली पगडी काढून ती जयाजी शिंदे यांच्या छावणीत पाठविली आणि पत्र दिले, " आजचे समयी तुम्ही वडील बंधु, मी धाकटा, कळेल त्या रीतीने बचाव करावा." शिंद्यांनी त्यांची विनंती मान्य केल्याने मल्हारराव काहीसे बिथरले. दोन मात्तबर मराठा सरदारांच्यात बेबनाव होणे हे पेशवाईसाठी चांगले नव्हते. अशावेळी सर्वकाही सुरळीत करण्यात सखारामबापूंची शिष्टाई फार मोलाची ठरली आणि सखारामबापू हे रघुनाथरावदादांचे खाजगी कारभारी झाले. त्यांनी पेशवाईसाठी अतिशय कष्ट घेतले व रघुनाथरावदादांचे निष्ठावान झाले. माधवराव पेशवेपदी असताना, त्यांना सखारामबापू हे अप्रिय होते, असे असूनहि ते महत्त्वाचे प्रसंगी त्यांचा सल्ला घेत यावरून त्यांचे महत्त्व किती होते हे दृष्टिपथास येते. मात्र नारायणराव पेशव्यांचा शनिवारवाड्यात खून झाल्यावर ते काहीसे बिथरले. त्यांनी रघुनाथरावदादांचा पक्ष सोडला आणि बारभाईचे नेतृत्व घेतले. पेशवाईच्या वर्चस्वासाठी झालेल्या गृहकलहात ते एका गटाचे प्रमुख झाले. नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नीला सुरक्षितेसाठी त्यांनी पुरंदर किल्यावर ठेवले. इ. स.१७७४ मधे नारायणराव पुत्र सवाई माधवराव या बालकाच्या नावाने पेशवाईची वस्त्रे सातारा छत्रपति यांच्याकडून त्यांनी आणली. उत्तरपेशवाईत अतिशय नावारुपाला आलेला हा मुत्सदी अनेक आरोपांचा धनी झाला. त्यांचा एकुलता एक मुलगा अंकोपंत याचे लग्न १ जानेवारी १७६७ रोजी भोर संस्थानचे अधिपति श्रीमंत रघुनाथ चिमणाजी पंतसचिव यांच्या गोदूबाई नामक मुलीशी सासवड मुक्कामी झाले. हा विवाह सोहळा सुमारे दोन महिने चालला होता. सखारामबापूंची मुलगी भोरच्या पंतसचिव घराण्यातील शंकरराव रघुनाथ यांस दिली होती. हा विवाह सोहळा सातारा जिल्ह्यातील वाई येथे २४ जानेवारी १७७९ रोजी संपन्न झाला होता व या लग्नप्रीत्यर्थ बापूंनी ४० हजार रुपये खर्च केले होते. सखारामबापूंचा एकुलता एक मुलगा आकोपंत मे  १७७५ मधे निधन पावला. उतार वयात घराण्याला वारस राहिला नाही. काळ फिरला होता, पेशवाईत ज्याच्या शब्दाला फार मोठा मान होता, तो सखारामबापू कैदेत पडला. महादजी शिंद्यांनी चाळीस शेर वजनाची चांदीची बेडी त्यांच्या पायात टाकली. २ आॕगष्ट १७८२ रोजी रायगड किल्ल्यावर कैदेत असताना पेशवाईतील एका शहाण्याचा अंत झाला.
     
     

                   हिवरे गावच्या रस्त्याच्या कडेला दोन दुर्लक्षित दगडी समाधि सदृश्य वास्तू आहेत, त्यापैकी एक लहान व एक मध्यम आकाराची आहे. या दोन्हीही वास्तू जर समाधिस्थळ असतील तर नक्कीच त्या गोपीनाथपंत व सखारामबापूंच्या असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा या पेशव्यांचे कारभारी असलेल्या सखारामबापूंचे स्मरण ही वास्तू पाहताना होते. 
     
     
     
     

     
    त्र्यंबकेश्वर मंदीर :-
    पुणे- सासवड रोडवर ( बोपदेव घाट ) या मार्गावर हिवरे हे गाव आहे. मंदीराच्या समोर ओढा आहे. चार ही बाजुने तटबंदी असून त्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. आत मुख्य मंदीर तसेच सोबत मारुती आणि गणपती मंदीर आहे. मंदीरासमोर दीपमाळ आहे आणि नंदी आहे. शिखर पेशवाई शैलीतील वाटते, यावरुन हे मंदीर १७ व्या किंवा १८ व्या शतकातील वाटते. इथला परिसर अतिशय प्रसन्न आहे. 
     
    मौजे हिवरे गावातील श्री संकेश्वर शिव मंदिर...
    हिवरे गावातील वीरगळ

    हिवरे गावातील वीरगळ –

      हिवरे गावातील जुन्या शिव मंदिरासमोर असेली ही वीरगळ.काहीशी रंग लावलेली ही वीरगळ अत्यंत उत्तम स्थितीत आहे. विरागळीच्या सर्वात वरच्या भागात कळस आणि त्या खाली चार भागात ही वीरगळ विभागलेली आहे.
      सर्वात खालच्या भागात वीर आडवा दाखवलेला आहे. त्या वरच्या भागात वीर दोन शत्रूंसोबत लढताना दाखवलेला आहे, दोन शत्रू हातात ढाल आणि तलवार घेऊन विराशी युद्ध करताना दाखवलेल्या या प्रसंगात वीराच्या हातात मात्र खंजीर दाखवण्यात आलेला आहे.
    त्या वरच्या भागात दोन अप्सरा वीराला स्वर्गात घेऊन जातानाचा प्रसंग कोरण्यात आलेला आहे.अप्सरा चवरीधारी असून विराने त्यांच्या खांद्यावर आपला एकेक हात ठेवलेला आहे. त्या वरच्या भागात वीर शिवलिंगाची पूजा करतानाचा प्रसंग आहे. युद्धात वीरगती प्राप्त झाल्यानंतर वीर श्री महादेवाच्या जवळ पोहोचल्याचे हे निदर्शक आहे. शिवलिंग आणि सोबत नंदी दाखवलेला असून, वीर शिवलिंगासमोर हात जोडून बसलेला आहे. स्वर्गातील पुजारी हातात घंटा आणि बिल्वपत्र घेऊन विराकडून ही पूजा करवून घेत आहे. विरगळीच्या सर्वात वरती मोक्ष प्राप्तीची खूण म्हणून कलश कोरलेला आहे.
       डोक्यावरील पगडीला दोन्ही बाजूंना असलेली गाठ आणि दोन्ही पायांमधून जमिनीला स्पर्श करणारा धोतराचा त्रिकोणी पट्टा ही शुंग कालखंडातील शिल्पांतील पुरुषांची वेशभूषा असते, हाच कपड्यांचा नियम इथं लावल्यास ही वीरगळ इसवी सनपूर्व १८५ ते ७५ या काळातील असावी असाही अंदाज बांधला जाऊ शकतो.हिवरे गावातील वीरगळ.
    डोक्यावरील पगडीला दोन्ही बाजूंना असलेली गाठ आणि दोन्ही पायांमधून जमिनीला स्पर्श करणारा धोतराचा त्रिकोणी पट्टा ही शुंग कालखंडातील शिल्पांतील पुरुषांची वेशभूषा असते, हाच कपड्यांचा नियम इथं लावल्यास ही वीरगळ इसवी सनपूर्व १८५ ते ७५ या काळातील असावी असाही अंदाज बांधला जाऊ शकतो.

    कानिफनाथ मंदिर :-

    श्रीक्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे. कानिफनाथ मंदिर संत कानिफनाथ यांना समर्पित आहे जे नऊ नवनथांपैकी एक होते, ज्यांना एकत्रितपणे नवनाथ म्हणतात . पुण्यातील सासवडजवळील बोपगाव येथे हे मंदिर आहे.
    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर
    कानिफनाथ मंदिरात कसे जायचे: मंदिर प्राचिनकालीन ( सुमारे ८०० वर्षापूर्वीचे )  आहे असे स्थानिक मानतात.ते या पंचक्रोशितील शिल्पकलेचा तउत्तम नमुना आहे. 

    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर
    कानिफनाथाचा डोंगर
    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर
    घरावर असलेली हि विमानाची टाकी

      पुण्यावरून दिवे घात मार्गे सासवड हे शहर सुमारे २८ कि.मी  वर आहे व  हडपसर पासून सुमारे १७ कि.मी. सासवड शहरापासून पश्चिमेकडे कोंढव्याकडे जाताना ९ कि.मी. वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. ४-५ कि.मी.  चा प्रवास व एक छोटा घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरापर्यंत पोहचता येते. कानिफनाथ मंदिरात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग बोपदेव घाटातून आहे. हे चांदणी चौक, पुण्यापासून सुमारे 35 किमी अंतरावर आहे. कात्रजहून जात असाल तर खादी मशीन चौकातून उजवे वळण घेऊन सरळ जावे. पुण्यावरून बापदेव घाट मार्गे सासवडला जाताना सुद्धा आपण कानिफनाथ मंदिराकडे जाऊ शकतो. ह्या रस्त्याच्या आजूबाजूला शेती आणि बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो.बोपदेव घाट संपला की काही किलोमीटर गेल्यावर डाव्या बाजूला एक मोठा बोर्ड दिसतो. त्यावर कानिफनाथ मंदिराचे प्रवेशद्वार असे लिहीलेले आहे. 
    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर



    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर

    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर

    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर



    सरळ गेल्यावर १-२ किमी नंतर टेकडीवर मंदिर आहे.इथे कार आणि दुचाकी पार्किंगची जागा उपलब्ध आहे. खाण्याच्या छोट्या टपर्‍या, पाण्याची टाकी इथे असल्यामुळे खाण्याचे काही नेले नाही तरी चालू शकते.
    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर


      

    मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार

    कानिफनाथ- पुण्याच्या आसपास एक दिवसाची सहल

    कानिफनाथ येथे सासवडजवळ एक दिवसाची सहल


    सासवडजवळील कानिफनाथ मंदिर

      वरती गेल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफनाथाचे.  मंदिरासाठी काही पायर्‍या चढून वर यावे लागते. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे, त्यात सरपटत आत शिरावे लागते.स्थानिक लोकांच्या मते, संत कानिफनाथ यांनी ही लेणी शोधून काढली,ज्याचे रुपांतर आता मंदिरात झाले आहे आणि म्हणूनच त्यांना समर्पित आहे.  मंदिरातील गाभारा मोठा आहे. मंदिरात गाभारा म्हणजे ९ इंच बाय ११ इंच अरुंद प्रवेशद्वार असलेली बंद खोली आहे. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. गाभार्यात एका वेळी फक्त दहा लोक आरामात उभे राहु शकतील इतकीच जागा आहे. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणि थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसते. एखाद्या भाविकाने मंदीरात प्रवेश करताना देवाकडे पाय करायचे नसल्यामुळे, भाविकाने प्रथम डोके देवाकडे करुन आत प्रवेश करणे अपेक्षित आहे बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते. लहान प्रवेशद्वाराशिवाय गाभार्याला दुसरा दरवाजा नाही.प्रथमच इथे आलेल्या भाविकाला खिडकीत अडकण्याची भीती वाटू शकते परंतु विशेष म्हणजे एखादा जाड पुरुष देखील सहज प्रवेश करू शकतात.

     मुख्य देवळाशिवाय कानिफनाथ मंदिराच्या परिसरात दत्त, विठ्ठल, काळभैरव यांची छोटी मंदिरे आहेत
    सासवड जवळील कानिफनाथ मंदिर
    मंदिराच्या इथून पुण्याचे दर्शन होते. लांबवर कात्रजमधले जैन मंदिर, बापदेव घाट असे दिसते

     कानिफनाथ सापडली.

    जय जय कानिफनाथ भगवान् योगीराज मुर्ती ।
    पतिपावना ओवाळू तुज सदभावे आरती ॥ ध्रु.॥

    ऋषभपुत्र श्रीप्रबुद्ध नामें नारायण मुर्ती ।
    गजकर्णामध्ये षोडष वर्षे केली निजवस्ती ।।
    नाथ जालिंदर कृपाप्रसादे वरिली ब्रम्हस्थिती ।
    द्वादश वर्षे बद्रिकावनी केली तपपूर्ती ।।
    नग्न देव उफराटे देही झोंबकळे घेती ।
    विनम्र भावे वस्त्रे नेसवूनी मिळवी वरप्राप्ती ।।
    जयजय...

    गंध केशरी सुगंधी पुष्पें अत्तराची प्रीती ।
    नेसूनी रेशमी वस्त्र भरजरी कफनी मोहक ती ।।
    सुवर्णमुद्रा कर्णी बोटीं मुद्रिका खुलती ।
    सुवर्ण गुंफित रुद्राक्षांची माळ गळा रुळती ।।
    सुवर्ण मंडित पायी खडावा कुबडी सोन्याची ।
    बालरवीसम तळपे मूर्ती दिनानाथा तुमची ।।
    जयजय...

    गादी मखमली लोड गालिचा शिबिका अंबारी ।
    छत्रचामरे चौरी ढाळती होऊनी हर्षभरी ।।
    चाले निशाण पुढती वाजे वाजंत्री भेरी ।
    भालदार चोपदार गाती बिद्रावळी गजरी ।।
    सत् शिष्यांचा मेळा संगे फिरसी अवनीवरी ।
    हे नाथा तव थाट स्वारीचा वर्णू कोठवरी ।।
    जयजय...

    नाथा तुमचा राजयोग परी विरक्तता विषयीं ।
    स्त्रीराज्यामध्ये मच्छिंद्रनाथें परिक्षियले समयी ।।
    प्रेमे गोपीचंद रक्षिला असूनीया अपराधी ।
    जती जालिंदर प्रसन झाले केवळ कृपानिधी ।।
    जन उपकारासाठी साबरी विद्या निर्मियली ।
    सिद्धाहातीं ओपुनी अवनीवरती विस्तारीली ।।
    जयजय...

    अवनी भ्रमूनी निजपंथाची महती वाढविली ।
    समाधी स्थापूनी स्वानंदाने मढी पावन केली ।।
    समाधिस्त परी अवनीवरी गुप्तरुपे फिरसी ।
    जो कोणी भाग्याचा पुतळा तयासी अनुग्रहिसी ।।
    गोरक्षांकित विठामाईचा दास गुरु भजनी ।
    तव गुण गाता आनंद झाला लीन सदा चरणी ।।
    जयजय...

    आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा

    मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य
    मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला,
    गोरक्ष वदला गहिनीप्रति
    गहिनी प्रसादे निवृत्ती दातार
    ज्ञानदेवे सार चोजविले

    रसवंती गृहांच्या नावाच्या मागचा इतिहास - 

      प्रत्येक वर्षी वातावरणाचे ऋतू हे बदलत असतात. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा हा ठरलेलाच. उन्हाची दाहकता वाढते आणि या रखरखत्या उन्हात प्रत्येक माणसाची पावले आपोआप शीतपेयाकडे वळतात. उन्हाची दाहकता जशीजशी जाणवते तसातसा कानावर घुंगराचा आवाज करत रसवंतीचा तो नाद निनादतो. आणि आपोआपच आपली पावलं तिकडे वळतात आणि गोड उसाचा रस पिऊन मन कसे तृप्त होते. पण त्या रसवंतीकडे जाताना नेहमीच आपल्या मनात एक प्रश्न उद्भवत असेल की जाहीर रसवंतीमध्ये आपण रसाचा आनंद घ्यायला जातो त्या सगळ्या रसवंतीचे नावं कानिफनाथ आणि नवनाथ अशीच का असतात. असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो त्यासोबतच आणखीन एक प्रश्न फार पूर्वी पासून आपल्या मनात घर करून आहे की महाराष्ट्र राज्याच्या कुठल्याही एस. टी. स्टॅंडवर गेल्यावर तिथं या नावाची एक रसवंतीगृह असतेच. पण हे काही असेच घडले नाहीये, किंवा हे सगळ अचानक झाले असे देखील नाही. या साऱ्या गोष्टीला खूप जुना आणि मोठा इतिहास आहे. काय आहे तो नेमका इतिहास, महाराष्ट्रातील रसवंतीगृहाला कानिफनाथ आणि नवनाथ ही दोन नावच का? या सगळ्यांचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत 
          रसवंतीगृहांना नवनाथ किंवा कानिफनाथ ही दोन्ही नावे असण्यामागे एक धार्मिक कथा आहे. नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथ महाराजांचा जन्म हा हत्तीच्या कानापासून झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हत्तीचे आवडते खाद्य म्हणजे ऊस. कानिफनाथ महाराजांचा जन्म हत्तीपासून झाल्याने त्यांना सुद्धा ऊस आवडत अशी अख्यायिका आहे. त्यामुळे ऊसाचा व्यवसाय करायचा असल्याने श्रद्धेच्या भावनेने अनेक जण रसवंती गृहला नवनाथ किंवा कानिफनाथ असे नाव देतात. आणि हे सगळं पारंपारिक रित्या गेल्या अनेक वर्षापासून असंच सुरू आहे. पण हे सारे इथेच संपत नाही. उसाच्या रसाचा व्यवसाय करणारे बरेचसे लोक पुणे जिल्ह्यातील एका गावातून येतात हे देखील आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहित नाहीये. पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील बोपगाव नजिकच्या डोंगरावरच्या गुहेत नाथसंप्रदायाचे नऊ नाथांपेकी एक कानिफनाथ महाराज ध्यानाला बसले होते. तिथे सध्या मंदिर देखील आहे. इतकंच काय तर तिथं राहणारे नागरिक स्वाभाविकपणे महाराजांचे भक्त आहेत. त्यामुळे तिथे व्यवसाय करणाऱ्या भक्तांनी रसवंतीगृहाचे नाव कानिफनाथ किंवा नवनाथ ठेवले आणि ती प्रथा आजही अशीच भावनेने जपली जाते आहे. इथल्या गावकऱ्यांचे हे मंदिर म्हणजे कुलदैवत. आज देखील येथे राहणारी लोक नवनाथांची तितक्याच आस्थेने पूजा करतात. आणि ही परंपरा अशीच चालू राहणार असल्याचे देखील तिथले गावकरी सांगतात. 

    मस्तानी तलाव :-

    पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. अशाच काही ऐतिहासिक ठिकाणांपैकी पुण्यापासून अगदी जवळ आणि दिवे घाटाच्या पायथ्याला एक तलाव आपल्याला पहायला मिळतो. हा तलाव आपण दिवे घाट चढताना कायम पाहत असतो पण फार कमी लोकं या ऐतिहासिक तलावाला भेट देत असतात. हा ऐतिहासिक तलाव ‘मस्तानी तलाव’ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे.
    पुण्यामधून आपण ‘सासवड’ कडे जाऊ लागलो की साधारणपणे २० कि.मी अंतरावर दिवेघाटाच्या अलीकडून एक रस्ता आपल्याला ‘वडकी’ या गावापर्यंत घेऊन येतो. पूर्वी याठिकाणी जाण्यास जवळपास ३ किलोमीटर पायपीट करावी लागत असे, आता रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम. दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला ‘मस्तानी तलाव’ आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे.
      <p>मस्तानी तलाव</p>

     तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे, कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे.






    या तलावाच्या पश्चिमेस आपल्याला तीन बुरुजांचे बांधकाम पहावयास मिळते. तसेच ‘मस्तानी तलाव’ याच्या काठावर एक गणपतीचे मंदिर देखील आहे.
    या गणपतीच्या मंदिरातील मूर्ती अत्यंत सुरेख आहे. तसेच ‘मस्तानी तलावा’च्या भिंतीवरून थोडे चालत गेले असता आपल्याला एक शिवलिंग देखील पहायला मिळते. या तलावाच्या इथे आपल्याला एक भुयाराचे तोंड देखील पहायला मिळते. या सुंदर ‘मस्तानी’ तलावाजवळ आपल्याला एक शिवमंदिर आणि हनुमानाची मूर्ती देखील पहायला मिळते.
       इ.स. १७२० मध्ये मस्तानी तलावाची निर्मिती करण्यात आली. याला एक आकर्षक इतिहास जोडलेला आहे. पूर्वी या तलावाला वडकी तलाव म्हणून संबोधले जात होते. पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी हे दोन या ठिकाणी येत होते. त्यानंतर तलावाला मस्तानी तलाव म्हणण्यात आले. हे तलाव मस्तानीच्या अंघोळीचे ठिकाण मानले जात असे. पुण्याच्या बाहेर असलेल्या तलावाला बाजीराव पेशवे आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांनी घोडेस्वारी करताना वारंवार भेट दिली होती. ते अनेकदा थांबून तलावात पोहायचे. बाजीरावांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी तलावाभोवती भिंती बांधण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या निधनानंतर लगेचच मस्तानीनेही अखेरचा श्वास घेतला. बाजीराव व मस्तानीने तलावाच्या भिंती पूर्ण झाल्याचे पाहिले नाही. आणि ते बांधल्यानंतर ३०० वर्षांनंतरही,तलाव आणि बाजुच्या भिंती काळाच्या कसोटीवर टिकल्या आहेत.
    अनेक स्थळांची नावे पूर्वापार रूढ असतात. मात्र, त्या स्थळांना ती नावे का व कशी देण्यात आली, याचा इतिहास अनेकदा माहीत नसतो किंवा तो विस्मृतीत गेलेला असतो. मस्तानी तलावही त्यापैकीच एक आहे. आजही मस्तानी तलावाविषयी विशेष काही माहिती उपलब्ध होत नाही. इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे व भास्वती सोमण यांना मस्तानी तलावाबाबत माहिती देणारी नोंद सापडली. मंडळातील दिवंगत अभ्यासक पांडुरंग पटवर्धन यांनी मंडळात आणलेल्या कागदांपैकी हा कागद असून, तो ‘याद’ या प्रकारात मोडणारा आहे. अशा प्रकारच्या कागदांमध्ये घडून गेलेल्या घटना नोंदवून ठेवलेल्या असतात.
         'मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला' असा संदर्भ या नोंदीत सापडतो. 
    मस्तानी तलावाच्या बांधकामासंबंधात आपल्याला एक ऐतिहासिक पत्र मिळते ते पत्र पुढीलप्रमाणे:-
       ‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसिजे. छ. १२ मोहरमी सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वी नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तर दक्षिण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्ण पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात, कोठे चार हात येणे प्रमाणे होते. पुढे उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोल्यांतील ओढे व दक्षिणेकडील कळ्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तळ्यात आणिले आहेत. सदरहू लिहिण्याप्रमाणे लिंगोजी निंबोणकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले’.
    बाजीराव पेशवे यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून मस्तानीकडे सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. नोंदीत उल्लेखलेल्या बागेचा मागमूसही आताच्या तलावानजीक सापडत नाही. या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे. गणेशमंदिर माधवराव पेशव्यांनी बांधले आहे. मात्र, शिव मंदिराची नोंद उपलब्ध नाही. पुढील काळात बाजीरावाचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी तलावात पाणी किती आहे हे पाहण्यास माणसे पाठवल्याचे पत्रही प्रकाशित आहे. याच कागदामध्ये नानासाहेब पेशवे यांनी नीरा नदीस मौजे पिंपरड येथे लाकडी पूल बांधल्याचीही नोंद असल्याचे लवाटे यांनी सांगितले.  तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी हा ‘मस्तानी तलाव’ बांधून घेतल्यावर पुढे नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये इ. स. १७५१ मध्ये या तळ्यासाठी काही रक्कम खर्च केल्याचे ‘नानासाहेब पेशवे’ यांच्या रोजनिशीमध्ये दिलेले आहे.
        मस्तानी तलाव तब्बल १४ एकर क्षेत्रात पसरलेला असून बाजूच्या हिरव्यागार टेकड्यां तलावाच्या आकर्षकपणात भर घालतात. हे एक नयनरम्य ठिकाण आहे.  तलावाभोवती दोन मंदिरे आहेत आणि बाजुच्या हिरव्यागार शेतातून ससे,हरीण आणि मोर दृष्टीस पडतात. येथे कॅमेरे काढून यांचे सौंदर्य टिपण्याचा मोह आवरता येणे कठीण आहे.
    २०१८ मध्ये, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या तलावाचे पुनरुज्जीवन केले. या तलावाचे उत्खनन करण्यात आले जेणेकरून त्याची पाणी साठवण्याची क्षमता वाढेल व आजूबाजूच्या गावांसाठी जलस्रोत ठरू शकेल. या ऐतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. पुण्याकडून सासवडकडे जाताना हडपसरच्या पुढे दिवे घाटापर्यंत गाडीतून जाताना तुम्ही तलावाचे व पक्ष्यांचे वैभव पाहू शकता. तलावाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात असतो, जेव्हा तलाव निळ्या पाण्याने भरलेला असतो आणि त्याच्या सभोवतालच्या टेकड्यांचे हिरवेगार एक निसर्गचित्र रेखते. 
    मुळातच ‘दिवेघाट’ आणि ‘सासवड’ या परिसरात पाऊस खूप कमी पडतो तसेच या तलावातील गाळ मध्यंतरी काढला होता परंतु परत तो साचला आहे. त्यामुळे या तलावात जेव्हा जोरदार पाऊस पडतो तेव्हा हा ‘मस्तानी तलाव’ पाण्याने भरतो अन्यथा हा तलाव कोरडा असतो. मध्यंतरी जोरात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरलेला होता. ‘मस्तानी तलाव’ संपूर्ण पाण्याने भरल्याचे वृत्त देखील काही वृत्तपत्रांमधून झळकले होते. असा हा ‘वडकी’ गावाजवळील सुंदर ‘मस्तानी तलाव’ नक्कीच भेट देण्यासारखा आहे!

    मस्तानी तलाव हे पिकनिकर्स आणि कॅम्पिंग प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.  मस्तानी तलाव आज एक रोमँटिक स्पॉट झाल आहे आणि येथे प्रेमीयुगुलांची नेहमी वर्दळ असते.

    संदर्भ :-
    १) पुणे जिल्हा गॅझेटीयर
    २) स्थापत्य- महाराष्ट्र शासन
    ३) आडवाटेवरचा महाराष्ट्र - प्र.के. घाणेकर
    ४) इये महाराष्ट्र देशी- प्र.के. घाणेकर
    ५) आव्हान - आनंद पाळंदे
    ६) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
    ७)  https://www.marathibuzz.com/baji-pasalkar
    ८)  https://www.discovermh.com
    ९) https://m.facebook.com
    १०) https://www.garvanemarathi.com
    ११) http://theroyaljagtap.blogspot.com
    १२) https://historicaltouch.com
    १३) https://mr.vikaspedia.in
    १४) https://www.marathisrushti.com
    १४) पेशवे दप्तर
    १५) मराठी दप्तर रूमाल - १ व २
    १६) पेशवे बखर
    १७) पुरंदरे दफ्तर
    १८) मराठ्यांच्या इतिहासाची साधने - राजवाडे खंड
    १९) रोजनिशीतील उतारे
    २०) शाहू बखर
    २१) आंगरे यांची हकीकत
    २२) ब्रम्हेंद्र-चरित्र
    २३) साधन परिचय
    २४) पेशवेकालीन महाराष्ट्र
    २५) मराठी रियासत
    २६) अप्रकाशित कागदपत्र
    २७) पेशवे घराण्याचा इतिहास
    २८) श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.   यांचे लिखाण
    २९)  https://www.maayboli.com
    ३०)पुरंदरे कृ.वा.- पुरंदरे दप्तर भाग १,२ २) सरदेसाई गो.स.- मराठी रियासत खंड ३,४
    ३१) दक्षिणेतील सरदारांच्या कैफियती, यादी वगैरे
    ३२) https://hdheritagewalks-in.translate.goog
    ३३) https://susheelrajagolkar.blogspot.com

    ३४) http://pritskulkarni.blogspot.com
    ३५) http://www.savitakanade.com/2019/07/blog-post_17.html







    नवनाथांपकी एक अडबंगनाथ यांचे मंदिर आळंदी जवळ डुडुळगाव येथे इंद्रायणी नदीजवळ आहे. असे सांगितले जाते कि डुडुळगावचे मूळनाव अडुळगाव होते व इथे अडबंगनाथ महाराज यांनी १२ वर्षे तप केले ! हे मंदिर आडबाजूला असून गावठाणाच्या शांत भागात आहे. या मंदिराला जरूर भेट द्यावी असे आहे,आपणास वेगळाच प्रसन्न अनुभव इथे येतो.





    ३०० वर्षे जुन्या मस्तानी तलावाचं नाव कसं पडलं? काय आहे यामागची रंजक कथा ?

    Shrikant Ashok Londhe

    पुण्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मस्तानी तलाव काठोकाठ भरला व याच्या बातम्या यायला सुरूवात झाली. ३०० वर्षे जुन्या या तलावाचे नाव मस्तानी तलाव कसे पडले याची एक चुरस कथा सांगितली जाते. मस्तानी तलावाचे ऐतिहासिक महत्व असून त्याचा भविष्यकाळही आशादायक आहे. जवळच्या खेड्यांमध्‍ये मुख्य जलस्रोताच्‍या प्रणयाचे प्रतीक म्‍हणून पुण्यातील मस्तानी तलावाला ओळखले जाते. तर जाणून घेऊया मस्तानी तलावाविषयीची रंजक कथा..

    इ.स. १७२० मध्ये मस्तानी तलावाची निर्मिती करण्यात आली. याला एक आकर्षक इतिहास जोडलेला आहे. पूर्वी या तलावाला वडकी तलाव म्हणून संबोधले जात होते. पहिले बाजीराव पेशवे आणि मस्तानी हे दोन लव्ह बर्ड्स या ठिकाणी येत होते. त्यानंतर तलावाला मस्तानी तलाव म्हणण्यात आले. हे तलाव मस्तानीच्या अंघोळीचे ठिकाण मानले जात असे.

    <p>मस्तानी तलाव</p>

    मस्तानी तलाव

    असे मानले जाते की, पुण्याच्या बाहेरील तलावाला बाजीराव पेशवे आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांनी घोडेस्वारी करताना वारंवार भेट दिली होती. ते अनेकदा थांबून तलावात पोहायचे. बाजीरावांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी तलावाभोवती भिंती बांधण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या निधनानंतर लगेचच मस्तानीनेही अखेरचा श्वास घेतला. बाजीराव व मस्तानीने तलावाच्या भिंती पूर्ण झाल्याचे पाहिले नाही. आणि ते बांधल्यानंतर ३०० वर्षांनंतरही,तलाव आणि बाजुच्या भिंती काळाच्या कसोटीवर टिकल्या आहेत. मस्तानी तलाव आज एक रोमँटिक स्पॉट झाल आहे आणि येथे प्रेमीयुगुलांची नेहमी वर्दळ असते.

    मस्तानी तलाव तब्बल १४ एकर क्षेत्रात पसरलेला असून बाजूच्या हिरव्यागार टेकड्यां तलावाच्या आकर्षकपणात भर घालतात. हे एक नयनरम्य ठिकाण आहे. मस्तानी तलाव हे पिकनिकर्स आणि कॅम्पिंग प्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. तलावाभोवती दोन मंदिरे आहेत आणि बाजुच्या हिरव्यागार शेतातून ससे,हरीण आणि मोर दृष्टीस पडतात. येथे कॅमेरे काढून यांचे सौंदर्य टिपण्याचा मोह आवरता येणे कठीण आहे.


    मस्तानी तलाव

    २०१८ मध्ये, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या या तलावाचे पुनरुज्जीवन केले. या तलावाचे उत्खनन करण्यात आले जेणेकरून त्याची जलाशयाची क्षमता वाढेल व आजूबाजूच्या गावांसाठी जलस्रोत ठरू शकेल. या ऐतिहासिक स्थळाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. पुण्याकडून सासवडकडे जाताना हडपसरच्या पुढे दिवे घाटापर्यंत गाडीतून जाताना तुम्ही तलावाचे व पक्ष्यांचे वैभव पाहू शकता. तलावाला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळ्यात असतो, जेव्हा तलाव निळ्या पाण्याने भरलेला असतो आणि त्याच्या सभोवतालच्या टेकड्यांचे हिरवेगार लँडस्केप एक पूरक कॉन्ट्रास्ट देते.

    मस्तानी तलावाच्या नावाचा इतिहास प्रकाशात

    Vivek Bhor

    म. टा. प्रतिनिधी, पुणे

    दिवेघाटाजवळच्या तलावाला ‘मस्तानी तलाव’ हे नाव कसे पडले, याची रंजक माहिती समोर आली आहे. भारत इतिहास संशोधक मंडळात सुमारे २५० वर्षांपू्र्वीच्या नोंदींचा कागद इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे आणि भास्वती सोमण यांना मिळाला असून, त्यात ‘मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला’ असा उल्लेख त्यात आहे.

    अनेक स्थळांची नावे पूर्वापार रूढ असतात. मात्र, त्या स्थळांना ती नावे का व कशी देण्यात आली, याचा इतिहास अनेकदा माहीत नसतो किंवा तो विस्मृतीत गेलेला असतो. मस्तानी तलावही त्यापैकीच एक आहे. आजही मस्तानी तलावाविषयी विशेष काही माहिती उपलब्ध होत नाही. इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे व भास्वती सोमण यांना मस्तानी तलावाबाबत माहिती देणारी नोंद सापडली. मंडळातील दिवंगत अभ्यासक पांडुरंग पटवर्धन यांनी मंडळात आणलेल्या कागदांपैकी हा कागद असून, तो ‘याद’ या प्रकारात मोडणारा आहे. अशा प्रकारच्या कागदांमध्ये घडून गेलेल्या घटना नोंदवून ठेवलेल्या असतात.

    'मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला' असा संदर्भ या नोंदीत सापडतो. बाजीराव पेशवे यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून मस्तानीकडे सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. नोंदीत उल्लेखलेल्या बागेचा मागमूसही आताच्या तलावानजीक सापडत नाही. या तलावाच्या जवळ शिवमंदिर व तटावर गणेशमंदिर आहे. गणेशमंदिर माधवराव पेशव्यांनी बांधले आहे. मात्र, शिव मंदिराची नोंद उपलब्ध नाही. पुढील काळात बाजीरावाचे चिरंजीव नानासाहेब पेशवे यांनी तलावात पाणी किती आहे हे पाहण्यास माणसे पाठवल्याचे पत्रही प्रकाशित आहे. याच कागदामध्ये नानासाहेब पेशवे यांनी नीरा नदीस मौजे पिंपरड येथे लाकडी पूल बांधल्याचीही नोंद असल्याचे लवाटे यांनी सांगितले.

    तलावात प्रचंड गाळ

    मस्तानी तलावाची पाणी साठवण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, त्यात प्रचंड प्रमाणात गाळ साचला आहे. २००३मध्ये एकदा गाळ काढण्यात आला होता. मात्र, तो जेमतेम दहा टक्केच होता, असेही लवाटे यांनी सांगितले.

     

    दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी तलाव पेशव्यांच्या इतिहासाच्या खुणा जपतोय


    आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


    पुणे शहराच्या आजूबाजूला अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे आहेत जी कायम खुणावत असतात. अशाच काही ऐतिहासिक ठिकाणांपैकी पुण्यापासून अगदी जवळ आणि दिवे घाटाच्या पायथ्याला एक तलाव आपल्याला पहायला मिळतो. हा तलाव आपण दिवे घाट चढताना कायम पाहत असतो पण फार कमी लोकं या ऐतिहासिक तलावाला भेट देत असतात. हा ऐतिहासिक तलाव ‘मस्तानी तलाव’ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे.

    पुण्यामधून आपण ‘सासवड’ कडे जाऊ लागलो की साधारणपणे २० कि.मी अंतरावर दिवेघाटाच्या अलीकडून एक रस्ता आपल्याला ‘वडकी’ या गावापर्यंत घेऊन येतो. पूर्वी याठिकाणी जाण्यास जवळपास ३ किलोमीटर पायपीट करावी लागत असे, आता रस्ता झाल्याने जाणे देखील सुकर झाले त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन जाणे कधीही उत्तम. दिवे घाटाच्या पायथ्याशी बांधलेला ‘मस्तानी तलाव’ आजही आपल्या इतिहासाच्या खुणा जपून आहे.

    दिवे घाटामधून दिसणारे ‘मस्तानी’ तलावाचे दृश्य.

    तसे पहायला गेले तर हे पेशवे काळातील एखादे छोटे धरण असावे, कारण याची नीट रचना आपण पाहिली तर याला एक बंधारा आपल्याला पहायला मिळतो. दिवे घाटाच्या डोंगरातून पावसाचे पाणी येऊन हे सगळे पाणी या बंधाऱ्यामध्ये साठवले जाते. या बंधाऱ्याला सुंदर कामान देखील आहे. साधारणपणे जवळपास ६ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या या तलावाच्या बंधाऱ्याची उंची ही जवळपास १५ फुट आहे.

    या तलावाच्या पश्चिमेस आपल्याला तीन बुरुजांचे बांधकाम पहावयास मिळते. तसेच ‘मस्तानी तलाव’ याच्या काठावर एक गणपतीचे मंदिर देखील आहे.

    या गणपतीच्या मंदिरातील मूर्ती अत्यंत सुरेख आहे. तसेच ‘मस्तानी तलावा’च्या भिंतीवरून थोडे चालत गेले असता आपल्याला एक शिवलिंग देखील पहायला मिळते. या तलावाच्या इथे आपल्याला एक भुयाराचे तोंड देखील पहायला मिळते. या सुंदर ‘मस्तानी’ तलावाजवळ आपल्याला एक शिवमंदिर आणि हनुमानाची मूर्ती देखील पहायला मिळते.

    मस्तानी तलावाच्या बांधकामासंबंधात आपल्याला एक ऐतिहासिक पत्र मिळते ते पत्र पुढीलप्रमाणे:-

    ‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसिजे. छ. १२ मोहरमी सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वी नक्षत्राचे पाणी, लांबी उत्तर दक्षिण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्ण पश्चिम अशी नव्वद व खोली कोठे तीन हात, कोठे चार हात येणे प्रमाणे होते. पुढे उत्तराचे दोन-तीन पाऊस बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोल्यांतील ओढे व दक्षिणेकडील कळ्याचे पालीबाहेरील ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तळ्यात आणिले आहेत. सदरहू लिहिण्याप्रमाणे लिंगोजी निंबोणकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले’.

    ‘मस्तानी’ तलावाचा बंधारा.

    तसेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी हा ‘मस्तानी तलाव’ बांधून घेतल्यावर पुढे नानासाहेब पेशवे यांच्या काळामध्ये इ. स. १७५१ मध्ये या तळ्यासाठी काही रक्कम खर्च केल्याचे ‘नानासाहेब पेशवे’ यांच्या रोजनिशीमध्ये दिलेले आहे.

    ‘मस्तानी तलाव’ हे नाव कसे पडले या संबंधीत २५० वर्षांपूर्वीचा एक महत्वाचा कागद पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळ’ येथे इतिहास संशोधक ‘मंदार लवाटे’ आणि ‘भास्वती सोमण’ यांना सापडला असता त्यामध्ये एक नोंद त्यांना मिळाली त्या नोंदीमध्ये जो उल्लेख येतो तो पुढीलप्रमाणे:-

    ‘मौजे वडकी येथील घाटाखाली तळे व बाग बाजीराव बल्लाळ प्रधान यांनी करून मस्तानी कळवातीण इजकडे ठेविला’ 


    ‘मंदार लवाटे’ आणि ‘भास्वती सोमण’ यांना सापडलेले ‘मस्तानी तलाव’ या संबंधित कागद. छायाचित्र क्रेडीट / सौजन्य राज मेमाणे.

    ‘बाजीराव पेशवे’ यांनी दिवे घाटाखाली तलाव बांधला आणि बाग तयार करून ‘मस्तानीकडे’ सोपवण्यात आली अशी माहिती या नोंदीतून कळते. तेव्हापासून या तलावास मस्तानीचे नाव पडले असावे. या नोंदीमध्ये असलेल्या बागेचा आज कोठेही पत्ता मात्र लागत नाही. मात्र हे स्थळ अजूनही उपेक्षित आहे.

    गणपती मूर्ती, शिवलिंग असलेले मंदिर आणि ‘मस्तानी’ तलावाचे भुयार.

    मुळातच ‘दिवेघाट’ आणि ‘सासवड’ या परिसरात पाऊस खूप कमी पडतो तसेच या तलावातील गाळ मध्यंतरी काढला होता परंतु परत तो साचला आहे. त्यामुळे या तलावात जेव्हा जोरदार पाऊस पडतो तेव्हा हा ‘मस्तानी तलाव’ पाण्याने भरतो अन्यथा हा तलाव कोरडा असतो. मध्यंतरी जोरात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरलेला होता. ‘मस्तानी तलाव’ संपूर्ण पाण्याने भरल्याचे वृत्त देखील काही वृत्तपत्रांमधून झळकले होते. असा हा ‘वडकी’ गावाजवळील सुंदर ‘मस्तानी तलाव’ नक्कीच भेट देण्यासारखा आहे!

    १) बाळाजी बाजीराव पेशवे रोजनिशी:- ग. चि. वाड, इंदूप्रकाश प्रेस, १९०६.

    कसे जाल:-

    १) सह्याद्रीमध्ये फिरताना योग्य ती काळजी नक्की घ्या. सह्याद्री हे डोंगरभटक्यांचे घर आहे.

    २) कुठल्याही किल्यावर, लेणीमध्ये, प्राचीन मंदिरामध्ये किंवा कोणताही ऐतिहासिक वारसा फिरताना योग्य ते भान ठेवा.
    ३) सह्याद्रीमध्ये फिरताना आणि नवीन अनुभव गाठीशी बांधताना हे ध्यानात ठेवा की त्या ठिकाणी फक्त आपल्या आठवणीच्या  पाऊलखुणा ठेवाव्यात.

    ४) धबधब्यामध्ये जात असाल तर योग्य ती सुरक्षा बाळगा अन्यथा पाण्याचा प्रवाह जर वाढला तर दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन धबधब्यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुरक्षित अंतर ठेऊन पाहिलेला कधीही चांगला.

     https://thepostman.co.in/mastani-talav-pune-historic-place-in-pune/

     

    दिवे घाटातुन सूर्यास्त व मस्तानी तलाव - सासवड
    दिवे घाटातुन सूर्यास्त व मस्तानी तलाव - सासवड



























     
    1916 साली कॅनडा च्या प्रकाशकांनी प्रकाशित पुण्याच्या संदर्भात पुस्तक बघायला मिळाले ज्यात पर्वती टेकडी चे दृश्य, सिंहगड ची छायाचित्र आणि नकाशा, सासवड, वानवडी घीरपीडी(घोरपडी) चा उल्लेख आहे.
    पुण्याचा अभ्यास करणार्यांना कदाचित उपयोग होईल.
    छायाचित्र झूम करा तळटीप दिलेली आहे.
    काही नकाशे पण दिले आहेत.
     
     
     













     
    On the way सासवड
    गढी बघायला खूपच छान आहे
    जुनी गढी आहे यात संग्रहालय आहे जाधवराव घराण्याचे .
    आत राहण्याची ही सोय आहे.
    गढी टुरिझम साठी दिली आहे त्यामुळे जेवण ,कॉफ़ी शॉप , अशी ही छानशी सोय आहे ...
    डेस्टिनेशन वेडिंग साठी जास्त चालत हे.
    2 दिवस outing साठी म्हणून मस्त आहे .
    आधी ही पाहून झालंय ,काल जायचे होते दुसरीकडेच पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये पाऊण तास अडकल्याने पुन्हा एकदा गढीवर
     
     
     
     
     
     

    माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज














     











     

    गावाचे नाव :- नारायणपूर 
    जिल्हा:- पुणे
    जवळचे मोठे गाव :- नारायणपूर , सासवड



    पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावात चालुक्य कालिन प्राचीन नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे. कापूरहोळ - सासवड रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून आपला मंदिराच्या परीसरात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला रामेश्वराचे छोटे देऊळ आहे. या देवळाबाहेर ४ फूट उंचीची हनुमानाची मुर्ती उघड्यावर ठेवलेली आहे. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाने पायाखाली अवकळेला दाबून ठेवल्याचे दाखवण्यात आलेले आहे. 

    नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी भंगलेली नंदीची मुर्ती ठेवलेली आहे. या सभामंडपाच्या उजव्या बाजूला स्टेडीयम मधे असते तशी पायर्‍या पायर्‍यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या मंदिराच्या भरभराटीच्या काळात या सभामंडपात होणारे कार्यक्रम प्रेक्षकांना समोरून व बाजूने पाहांयासाठी ही व्यवस्था केली असावी. पायर्‍यांच्या डाव्या बाजूला खालील बाजूस गध्देगाळ बसबलेला आहे. मंदिराचे छ्त कोसळल्यावर त्यातील दगड आजूबाजूच्या बांधकामात वापरलेले आढळतात. नारायणेश्वर मंदिराचा कळस काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे. या कळसाच्या जागी सिमेंटचा (अतिशय भयानक) मंदिराच्या रचनेला न शोभणारा कळस बांधलेला आहे.


    मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे. दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी दिसतो. मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे. सभामंडपात ३ एक अक्षरी शिलालेख आहेत. प्रवेशव्दारातून आत आल्यावर डाव्या बाजूस खांबावर "चांगा वटेश्वर" व त्याच्या पुढे शेवटच्या खांबावर "चांगा वटेश्वराचा श्रीधरयोगी" असे शिलालेख कोरलेले आहेत. सभामंडपाला असलेल्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराच्या डावीकडील बाजूवर "अंचालध्वज" कोरलेले आहे.सभामंडपाच्या दक्षिणेकडील भिंतीवर २ गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे. चांगदेव व त्यांच्या शिष्यांनी या मंदिरात तपश्चर्या केली होती. 

    मंदिरातील गाभार्‍याच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या आहेत.हे दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या असल्या तरी त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा बाहेर आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो "राक्षस" गण असून दुसरा "देव" गण आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

    गाभार्‍यात उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार खड्डा दिसतो. त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणतात. यातील सर्वात मोठी पिंड विष्णुची (नारायणेश्वराची) असून ती बाराही महीने पाण्यात असते. पुरंदर किल्ल्यावर उगम पावणार्‍या केदारगंगेचे पाणी येथून वाहाते अशी श्रध्दा आहे. गाभार्‍याच्या उजव्या कोपर्‍यातील भिंतीत एक दगडी पात्र बसवलेले आहे. पावसाळ्याचे ४ महीने छतावर पडणारे पाणी यात जमा होते. वर्षाचे बाकीचे महीने मंदिरा मागिल बांधीव कुंडातून पाणी आणून मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या कोनाड्यात ओततात तेथून ते दगडी पात्रात येते व तेच पाणी अभिषेकासाठी वापरतात. अशा प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण रचना या मंदिरात पाहायला मिळते. मंदिराच्या गाभार्‍यात पार्वतीची भग्न मुर्ती आहे.

    गाभारार्‍यातील नारायणेश्वराचे दर्शन घेऊन सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशव्दाराने बाहेर पडावे. या दरवाजाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षी आहे. या व्दारासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात.  



        आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- 
    १) पुरंदर व वज्रगड किल्ला.
    २) मल्हारगड (सोनोरीचा किल्ला), सासवड मार्गे २० किमी अंतरावर आहे.
    ३) नारायणपूरचे बालाजी मंदिर १५ किमी अंतरावर आहे.

    जाण्यासाठी :- 
    पुण्याहून ३० किमी अंतरावर सासवड गाव आहे. सासवड ते नारायणपूर अंतर १२ किमी आहे. नारायणपूर हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव  आणि एकमुखी दत्ताच्या देवळा यामुळे प्रसिध्द आहे. नारायणपूर गावातच एकमुखी दत्त मंदिराच्या बाजूला रस्त्यालगतच नारायणेश्वराचे मंदिर आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. 

    पुणे - बंगलोर हायवेने (४६ किमी वरील) कापुरहोळ गावापर्यंत यावे. येथे हायवे सोडून कापूरहोळ - सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर (३.५ किमीवर) बालाजीचे प्रसिध्द मंदिर  आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.

    सूचना :- 
    १) खाजगी वाहानाने पुण्याहून पुरंदर किल्ला व लेणी आणि नारायणेश्वराचे मंदिर ही ठिकाणे एका दिवसात पाहून होतात.
    २) पुरंदर, वज्रगड आणि मल्हारगड किल्ल्याची माहिती साईटवर दिलेली आहे.




    Temples in Maharashtra, Ancient Temples in Maharashtra

    श्री क्षेत्र नारायणपूर 

    दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

     

            नारायणपूरला पोहचल्यावर गाडीतळावर गाडी लावून दर्शन घेण्यासाठी गेलो. ऐव्हाना दुपारचे दीड वाजले होते. प्रवचन सुरू होते. प्रवचनानंतर आरती सुरू झाली. काही भक्तांच्या अंगात येणे हा प्रकार या ठिकाणी पाहावयास मिळतो. सुमारे अर्धा तास तरी हा प्रकार सुरू असतो. कोणी श्रद्धा म्हणा अथवा अंधश्रद्धा पण हा प्रकार अवघडच आहे. असो. श्री दत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूरला ओळखले जाते.  श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी  नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर  आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत.  संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे.  हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.

    नारायणेश्वर मंदिर

                पुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या  पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असा एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.

      मंदिराचे दगडी बांधकाम  अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६  फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो. 

     नारायणपूरचे मूळ नाव पूर.  यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे.

      हे सुंदर मंदिर त्याच्या मूळ स्वरुपात असते तर अधिकच छान दिसले असते. मात्र, रंगरंगोटी करून त्याची लया घालावली आहे.  मंदिराचा असला जिर्णोद्धार काय कामाचा. असो,  सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.

    या दरवाजासमोर धनकेश्वराच देऊळ आहे. मंदिराच्या मागिल बाजूस असलेल्या तटबंदीत प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर समोरच एक बांधीव तलाव आहे, त्याला चंद्रभागा म्हणतात.  मात्र, या तलावाची योग्य निगा राखली गेली नसल्याचे दिसून येते. शंकर भगवानचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र दत्त संस्थातर्फे देण्यात येणारा मोफत प्रसाद खाण्यास गेलो.

    पोटभर प्रसाद

                श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. मी व माझे मित्र पूर्वी पुरंदरावरून दुपारी ३ पर्यंत खाली उतरून आल्यावर दत्त महाराजांचे दर्शन घेऊन पोटभर प्रसाद खात असे. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.
    एक दिवस वेळ काढून नक्कीच नारायणपूर व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देता येईल असा हा सर्व परिसर आहे.

    पुरंदर किल्ला

    नारायणपूरला मंदिरामागे पुरंदर किल्ला आहे.  या पुरंदरावर शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत. प्रसिद्ध पुरंदरचा तह, मुरारबाजींचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराज, सवाई माधवराव यांचे हे जन्मस्थान. पुरेसा वेळ असल्यास नक्कीच या किल्लयावर जाऊ या. पुरंदर गडावरून सर्वच परिसर मोठा सुरेख दिसतो. येथे जाण्यासाठी मुख्य मंदिराकडे येतानाच रस्ता आहे. या विषयी पुन्हा कधीतरी.

    कसे जाल :

    नारायणपूरला पुण्याहून जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक तर कापूरओव्हळ मार्गे बालाजी दर्शन घेऊन नारायणपूरला येता येते. दुसरे हडपसर मार्गे दिवेघाटातून नारायणपूरला येता येते. तसेच बापदेव घाटातूनही येता येते.

    • स्वारगेट > कापूरओव्हळ (२५ किमी पुणे - सातारा रस्त्यावर) > नारायणपूर मंदिर (१५ किमी)
    • सासवड  >   नारायणपूर अंतर १२ किमी आहे.
    • स्वारगेट > नारायणपूर अशी एसटी सेवा उपलब्ध आहे.
    • स्वारगेट >  हडपसर मार्गे सासवड ३० किमी अंतर > नारायणपूर मंदिर (१० किमी)

    अजून काय पहाल :

    प्रति बालाजी मंदिर (कोपूरओव्हळ)
    पांडेश्वर मंदिर
    भुलेश्वर मंदिर
    पुरंदर, व्रजगड किल्ला
    कानिफनाथ मंदिर

    पुरंदर- वज्रगड किल्ला   
    संगमेश्वर मंदिर
    नारायणेश्वर मंदिर
    वटेश्वर मंदिर
    बालाजी विश्वनाथ यांची समाधी
    मल्हारगड
    जेजुरी

    पूरचा नारायणेश्वर

    पूर गाव सासवडपासून तसं १०/१२ किमी अंतरावर. गावात जाताना पुरंदर किल्ला सतत नजरेसमोर राहात असून जवळजवळ येत असतो. ह्याच गावात आहे नारायणेश्वराचं सुंदर देऊळ.
    माझ्या अंदाजाप्रमाणे संगमेश्वर आणि वटेश्वरापे़क्षाही हे अधिक प्राचीन आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शैव द्वारपालांवरुन हा निष्कर्ष काढता येतो.

    ह्याही मंदिराच्या बाह्यभिंतीवर तसेच सभामंडपातही शिल्पे नाहीत. जी काही मोजकी शिल्पे आहेत ती मंदिराच्या प्रवेशद्वारावरील द्वारपालांच्या रुपात आणि गाभार्‍याच्या द्वारपट्टीकेवरील भैरवांच्या रुपात आणि ह्याखेदीज नटराज शिवाचे एकमेव शिल्प येथे आहे.

    मंदिराचं आवार विस्तृत आहे. आवारातच एका ठिकाणी चपेटदान मुद्रेतल्या वीर मारुतीची मूर्ती ठेविली आहे. हा मारुती शिवकालीन आहे.

    वीर मारुती

    a

    नारायणेश्वर मंदिर

    a

    काही भग्न स्तंभ आणि द्वारचौकट

    a

    द्वारचौकटीवर दोन्ही बाजूसं शैव प्रतिहारी आहेत. कडेच्या बाजूस असणार्‍या मूर्तीच्या हातात लआंबटसर अशी पिशवी दिसते. ह्याचा अर्थ हे मंदिराच्या बांधकामासाठी धन आणत आहेत असा होतो.

    a

    a

    नटराज शिव

    a

    द्वारचौकटीवरील नक्षीकाम

    a

    सभामंडप हा पुष्कळ स्तंभांवर तोललेला आहे मात्र ह्या स्तंभांवर शिल्पे नाहीत शिवाय नक्षीसुद्धा नाही.

    a

    गर्भगृहाच्या दोन्ही बाजूस असलेले भैरव द्वारपाल अतिशय देखणे आहेत. एकाच्या हाती त्रिशुळ आणि डमरु आहे तर दुसर्‍याच्या हाती डमरु आणि नाग आहे.

    a----a

    a

    a

    गाभार्‍याचं कमळाच्या आकृतीत कोरलेलं नक्षीदार छत

    a

    मंदिराच्या दगडी बाह्यभिंती अतिशय सुंदर दिसतात. भिंतीत काही ठिकाणी देवकोष्ठे केलेली दिसतात पण ह्यात आज मूर्ती नाहीत.

    a

    a

    a

    ह्याच मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलीकडे शेतात काही सतीशिळा दुर्लक्षित अवस्थेत पडलेल्या आहेत. त्यातली एक सतीशिळा तर कमालीची देखणी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या सतीशिळेवर सतीचे चार हात कोरलेले आहेत. ह्याचा अर्थ चार वेगवेगळ्या वीरपत्नी येथे सती गेल्यात असा होतो. एकाच वीराच्या चार पत्नी सती जाणे हे संभवनीय नाही.
    सतीच्या हातांखाली युद्ध करण्यार्‍या वीराचा प्रसंग कोरलेला आहे. व त्याचे खाली चार वीरपत्नी प्रार्थना करताना दाखवलेल्या आहेत. सर्वात खालच्या प्रसंगात चितेवर बसून सती जाणार्‍या स्त्रीचा प्रसंग कोरलेला आहे. व सर्वात वरच्या पट्टिकेवर ह्या स्त्रीया कैलासास जाऊन शिवलिंगाची आराधना करताना दाखवलेल्या आहेत.

    a

    ह्याच सतीशिळेच्या जोडीला वीरमारुतीची एक मूर्ती आहे.

    a

    ह्याच्या समोरच शेतात असलेली एक दुर्लक्षित सतीशिळा.

    a

    ही झाली सासवडच्या काही प्राचीन मंदिरांची थोडक्यात ओळख. अजूनही काही प्राचीन मंदिरे ह्या परिसरात असतील. थोडा शोध घेतला पाहिजे. पण सासवडच्या आसपासचा परिसर हा प्राचीन अवशेषांनी अगदी वेढलेला आहे. ह्याच्या आसपासच्या नाझरे, माळशिरस, नायगाव ह्या लहानशा गावांमध्ये असणारे कित्येक वीरगळ, सतीशिळा, काही मोडलेली मंदिरे, काही अजूनही शाबूत असणारी पण मूळचे सौंदर्य हरवलेली मंदिरे मी हिंडून पाहिली आहेत त्याबद्दल पुन्हा कधीतरी. 


     एकमुखी दत्तमंदीर श्री क्षेत्र नारायणपूर – डिसेंबर २०१८

    आपण पुण्याच्या दक्षिणेला असलेल्या दिवेघाटातून सासवडला जाऊन तेथून पुढे नारायणपूर ला जाऊ शकतो किंवा सातारा रोडने गेल्यास कापूरओहोळ वरून डावीकडे वळून नारायणपूरकडे पोहोचू शकतो. हे स्थान ऐतिहासिक पुरंदर किल्याच्या पायथ्याशी आहे. नारायणपूर हे श्री. चांगदेव महाराजांचे गाव आहे. यागावात जूना औंदूंबर वृक्ष आहे. पूरातन शिवमंदीर हेमाडपंथी आहे. श्री. नारायण महाराज यांनी येथेच तपश्चर्या केल्याचे सांगतात.










    पुण्यापासून साधारण ३०-३५ किमी अंतरावर असलेले हे दत्तमंदीर सर्वांग सुंदर एकमुखी, षडभूज दत्तमूर्तीमुळे प्रसिद्धीस आलेले आहे. त्यासमोरच संगमरवरी पादुका आहेत. दत्तभक्त येथे प्रामुख्याने गुरुवार पौर्णिमा वारी करतात. दत्तजयंती येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यावेळी येणाऱ्या भक्तगणांची संख्या लाखात असते. येथे येणारे भावीक मुख्यत्वे करून श्री सदगुरु नारायण महाराज उर्फ आण्णा यांचे प्रवचन ऐकण्यास येतात. माणसांमधील माणूस जागा करणे हे मुख्यत्वे करून नारायण महाराजांचे ध्येय आहे असे ते सांगतात.
    सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पूरातन दत्त पादूका आहेत. सदर परिसरात रहाण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त सभामंडप आहे. निसर्गरम्य किल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्रीगुरुंच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले आहे. "जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता" असा मंत्र येथे जपला जातो.
    येथे श्री दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा होतो. दत्तजन्म पाळणा हलवून करतात. रात्री शोभेचे दारूकाम, दत्तजन्माचे किर्तन असते. दुसऱ्या दिवशी उत्सवमूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेस जातात. ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते. तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात. या मिरवणूकीत हत्ती, घोडे, उंट असा सर्व लवाजमा असतो. दत्तभक्तांचा हा सोहळा पहाण्यासाठी महापूर लोटतो.
     

     नारायणपूर, पुरंदर किल्ला 🏰, चांगावटेश्वर मंदिर🛕, सासवड, मल्हारगड ०७-मे-२०२२

    उन्हाळा व इतर कारणामुळे खूप दिवस ट्रेकला जाऊ शकलो नाही. शेवटी अजित ला देखील रहावले नाही. आणि त्याने शुक्रवारी दुपारी १ वाजता फोन केला व उद्या कुठेतरी जाऊया असे सांगून लगेच मुंबई सोडून पुण्याला आला. मग रात्री थोडी चर्चा करून सासवड विभागामध्ये फिरायचे नियोजन ठरवले. शनिवारी सकाळी ०५:०० वाजता बाईकला किक मारली. पुढे केतकावळे पुणे येथील बालाजी मंदिरा मध्ये सकाळी ०७:०० वाजता पोहचलो. 🛕 त्या सकाळचा प्रसन्न अशा वातावरणा मध्ये पहिल्या आरती सोबत बालाजीचे दर्शन घेतले व पुढे नारायणपूरकडे निघालो.

    बालाजी मंदिर - केतकावळे पुणे
    बालाजी मंदिर - केतकावळे पुणे
    बालाजी मंदिर - केतकावळे पुणे
    बालाजी मंदिर - केतकावळे पुणे

    नारायणपूर - नारायणेश्वर मंदिर  व  दत्त मंदिर 🛕
    नारायणपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे. प्रथम तेथील पुरातन नारायणेश्वर मंदिरा मध्ये दर्शन घेतले. हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकाम असलेले पाहायला मिळाले. मंदिरा समोर नंदी आहे कदाचित या नंदी वरती पूर्वी सभामंडप असावा. मंदिरा वरील नक्षीकाम हे पाहण्या सारखे आहे. नारायणेश्वर मंदिरा भोवती पूर्वीची जुनी दगडी तटबंदी आहे. तसेच नारायणेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या एक मुखी दत्त मंदिरा मध्ये दर्शन घेतले. हे दत्त मंदिर एक धार्मिक तीर्थ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. दोन्ही मंदिरे पाहून झाल्या नंतर तेथून आम्ही पुरंदर किल्ला पाहायला निघालो.

    नारायणेश्वर मंदिर - नारायणपूर
    नारायणेश्वर मंदिर - नारायणपूर

    नारायणेश्वर मंदिर - नारायणपूर
    नारायणेश्वर मंदिर - नारायणपूर

     नारायणेश्वर मंदिर | Discover Maharashtra


    नारायणेश्वर मंदिर

    नारायणेश्वर मंदिर – नारायणपूर

    नारायणपूर हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. याच गावात प्राचीन नारायणेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत आजही उभ आहे.

    पुणे बंगलोर हायवरील कापुरहोळ गावापर्यंत आल्यानंतर हायवे सोडून कापूरहोळ – सासवड रस्ता पकडावा. याच रस्त्यावर साधारण ३.५ किमीवर बालाजीचे प्रसिध्द मंदिर आहे. पुढे १५ किमी वर नारायणपूर गाव आहे.

    पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या प्रसिद्ध नारायणपूर गावात हे प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. रस्त्याला लागुन असलेल्या नारायणेश्वर मंदिरा भोवती ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या छोट्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात प्रवेश करता येतो.

    नारायणेश्वर मंदिर पश्चिमाभिमुख असून मंदिरा बाहेरील सभामंडप कोसळलेला आहे. या सभामंडपाचे खांब शाबूत आहेत. सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मुर्ती आहे. मंदिराच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. व्दारपट्टीच्या मधोमध गणपती आहे. दरवाजाच्या दोनही बाजूस २ फूट उंचीच्या गणेश मुर्ती आहेत. त्यातील एक उजव्या सोंडेची गणेश मुर्ती आहे.

    मंदिरात प्रवेश केल्यावर पितळेचा नंदी दिसतो. मंदिराच्या आतील सभामंडप ४ मोठ्या दगडी खांबांवर तोललेला दिसतो. या खांबांच्या मधोमध असलेल्या दगडी जमिनीवर मोठे कासव कोरलेले आहे.
    मंदिरातील गाभार्याीच्या दरवाजा बाहेर दोन ५ फूटी अप्रतिम मुर्ती कोरलेल्या आहेत.हे दोन्ही शंकराचे गण आहेत. दिसायला या दोनही मुर्ती जरी सारख्या असल्या तरी त्यात एक छोटासा फरक आहे. एका मुर्तीच्या तोंडातून त्याचा सुळा बाहेर आल्याच दाखवण्यात आलेले आहे. सुळा बाहेर आला आहे तो “राक्षस” गण असून दुसरा “देव” गण आहे. गाभार्याहच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.
    गाभार्याषत उतरल्यावर काचेखाली दगडात कोरलेले एक मोठा वर्तुळाकार खड्डा दिसतो. त्याच्या आतमध्ये यांच्या तीन स्वयंभू पिंडी आहेत. त्यांना ब्रम्हा, विष्णू व महेश म्हणतात.

    सभामंडपाच्या उत्तरेकडील दरवाजाच्या व्दारपट्टीवर सुंदर नक्षी आहे. नारायणेश्वर मंदिराचा आजूबाजूचा परिसर अत्यंत मोठा असून आजही थोडे बहुत प्राचीन शिल्प मंदिराच्या आवरात पडलेली आपल्याला पाहायला मिळतात

     

     उपेक्षित पाणपोई ?

    ( क्रमांक ६८ )

    दि.२६ जानेवारी २०२१ रोजी श्री.
    Pravin Shrisunder
    सरांनी मुखपुस्तिकेवर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात येणाऱ्या सुपे नजीक असलेल्या प्राचीन पाणपोईचे चलचित्रण व काही प्रकाशचित्रे प्रकाशित केली होती. मी ब-याच वेळा सुपे येथे गेलो होतो, परंतु ह्या वास्तूबाबत अनभिज्ञ होतो.सुपे परिसरात प्रत्येकवेळी जाण्याचा योग निव्वळ आनंद गोसावी यांच्यामुळे आला होता. मी गोसावी सरांना या वास्तूबाबत माहिती विचारली तर ते म्हणाले की, मला ठिकाण माहित आहे पण मी देखील जवळ जाऊन पाहिले नाही. आज गोसावी सरांना काही कामानिमित्ताने त्या भागात जायचे होते म्हणून मला देखील बरोबर घेऊन गेले.
    दुपारी दोन वाजता सुपा गावातून पाटसकडे जाणा-या रस्त्याने सुमारे पाच किलोमीटर अंतर गेल्यावर घाट उतार सुरू होतो, तेथेच उजव्या बाजूला ही उत्तराभिमुखी वास्तू आपले गतकाळचे वैभव सांभाळत नेटाने उभी आहे. ह्या घाटाला 'पोईचा घाट' किंवा ' ५६ मिरीचा घाट ' या नावाने ओळखले जाते. सामाजिक वनीकरणच्या निर्रोपयोगी वनस्पतींची गराड्यात असल्यामुळे चटकन लक्षात येत नाही. संपूर्ण दगडी बांधकामातील चार पाच फूट उंचीच्या जोत्यावर शुष्कबांधा पद्धतीने चौदा नक्षीदार स्तंभावर ही वास्तू उभी आहे. इमारतीचे हे स्तंभ तळाशी खाचेच्या घडीव दगडावर सुमारे चारपाच फूट उंचीच्या कलात्मक स्तंभावर, गोलाकार व शेवटी चार बाजूनां विस्तारीत होणाऱ्या दगडांवर दगडी छत आच्छादलेले आहे. छत व स्तंभा दरम्यान असलेल्या दगडावर उलट्या सुबक नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. तीनहि बांजूच्या दगडी भितींना कोठेहि गवाक्ष किंवा दरवाजा नाही, इमारतीच्या डाव्या भिंतीत चौकोनी आकाराची जागा निर्माण केलेली आहे तर डाव्या बाजूच्या कोपऱ्यात जमिनीत पुरलेला भव्य दगडी रांजण आहे. आतील तळाशी असलेल्या दगडींचे खोदकाम झालेले दिसून येते.
    सुमारे हजार वर्षापेक्षा जास्त कालखंडापूर्वीची ही वास्तू असावी. ही निव्वळ पाणपोई म्हणणे संयुक्तिक होणार नाही कारण येथे कधीकाळी व्यापारी/प्रवासी रात्रीचा मुक्काम करीत असले पाहिजेत. या वास्तूचा निर्माता किंवा कालखंड उजेडात आल्यास ऐतिहासिक 'सुपा परगणा' बाबतीत नवीन इतिहास उपलब्ध होईल असे वाटते.
    © सुरेश नारायण शिंदे, भोर

     बनेश्वर महादेव मंदिर - जुलै २०१९

    पुण्यापासून दक्षिणेला सातारा हायवेवर सुमारे ३५ किलोमीटरवर डोंगरटेकड्यांनी वेढलेल्या गर्द वृक्षराजीत, पुण्याजवळील नसरापूर गावाजवळ हे शिवालय वसले आहे. मंदिराभोवती दाट बन, म्हणजेच जंगलझाडी आहे. त्यामुळेच या शिवालयाला 'बनेश्वर' नाव मिळाले आहे.
    पक्ष्यांचा किलबिलाट ऐकतच आपण मंदिराच्या तटबंदी ला असलेल्या मुख्य दारात येतो. तटाला असलेल्या एका कमानी दरवाजातून आत आल्यावर आपणांस मुख्य मंदिर, दोन छोटे कुंड, हनुमान मंदिर, गणपती मंदिर दिसून येतात. या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला महादेवाच्या पिंडीबरोबरच लक्ष्मी आणि विष्णू यांच्या मुर्तीही आहेत.
    बनेश्वर मंदिराची रचना मध्यकालीन वास्तुशिल्पाप्रमाणे असून, ह्या मंदिराची स्थापना पेशवे बाजीराव ह्यांचे पुत्र नानासाहेब पेशवे, ह्यांनी १७४९ मध्ये केली. मंदिरास उभारण्यास एकूण खर्च ११४२६ रुपये ८ आणे आणि ६ पैसे असा आला.










    मंदिराच्या आवारात एक विशाल घंटा आहे. चिमाजी अप्पा ह्यांनी एका युद्धात पोर्तुगीस सैन्यास पराभूत केल्याचे विजयचिन्ह म्हणून ही घंटा ओळखली जाते. ह्या घंटेवर १६८३ हे साल असून एक क्रॉस आहे.
    येथे अद्भुत पाण्याचे पाट आपल्याला पहायला मिळतात. (पाणी वाहत असेल तर) या मंदिराभोवती फरसबंदीलगत चक्रव्यूहकार रचनेतील दगडी पाटातूनही पाणी वाहताना दिसते. तसेच समोरच्या कुंडातही गोमुखाद्वारे पाण्याची धार वाहत असते. बनेश्वरच्या या बनाच्या मागून शिवगंगा नदी वाहते. या नदीवरच केळवडे गावाजवळ एक बंधारा घातलाय. या डोहातूनच एक योजना बांधत मंदिरापर्यंत पाणी आणले आहे. या पाण्याचे इथे पुन्हा भूमिगत असे दोन प्रवाह होतात. एक मंदिराभोवती फिरतो तर दुसरा कुंडात गोमुखाद्वारे पडतो. पाणी खेळवण्याची ही उद्भुत रचना जरूर पहावी.
    पुण्यातील स्वारगेटहून सुटणाऱ्या एस. टी. किंवा पीएमपीएलच्या बस सोयीच्या. या नसरापूरला उतरले, की एक दीड किलोमीटर चालण्याच्या अंतरावर बनेश्वर!

     बनेश्वर धबधबा आणि वन उद्यान - जुलै २०१९

    श्रावणातील हिरवे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी डोंगरकुशीतील एखाद्या शांत शिवालयाच्या शोधात असाल तर, पुण्याजवळच्या बनेश्वरला जा. बनेश्वर पुण्यापासून दक्षिणेला सातारा हायवेवर सुमारे ३५ किलोमीटरवर आहे.
    डोंगरटेकड्यांनी वेढलेल्या गर्द वृक्षराजीत, पुण्याजवळील नसरापूर गावाजवळ हे शिवालय वसले आहे. मंदिराभोवती दाट बन, म्हणजेच जंगलझाडी आहे. त्यामुळेच या शिवालयाला 'बनेश्वर' नाव मिळाले आहे.
    बनेश्वरचे हे बन बरेच जुने आहे. आंबा, जांभूळ, करंज, लिंब, कवठ, वड, पिंपळ असे अनेक पुराण वृक्ष वनाच्या वैभवात भर घालतात. केतकी आणि करंजाची झाडे इथे सर्वाधिक. आता यालाच वनविभागाने नवे रुप दिले आहे. वनोद्यान, रोपवाटिका काढली आहे. अशा वनातून एखादी चक्कर जरी मारली, तरी आपल्याकडील झाडा-पानांचे वैविध्य समजते. या झाडीतूनच तयार केलेली एक वाट मागे शिवगंगा नदीवर जाते.













    ही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते. फेसाळणाऱ्या या पाण्यावर एक छोटासा धबधबा तयार होतो. हिरव्यागार डोंगराच्या पाश्र्वभूमीवर नदीचे हे रुप पाहण्यासाठी इथे काठावर एक उंच मनोरा ही उभारला आहे. नदीच्या कडेला डुलणारी उसाची, भाताची शेते, स्वच्छ पाण्याने खळाळणा-या नदीकाठी चरणारी गुरे, विविध जातींचे पक्षी यांचे निवांत निरिक्षण करणे हा स्वर्गीय अनुभव आहे.
    या वाहत्या धबधब्यामध्ये अनेकजण उतरतात पण हे धोकेदायक आहे. वन खात्याने आता तेथे सुरक्षा रक्षक नेमले आहेत. उद्यानात प्रवेश करतांना प्रवेश फी द्यावी लागते.
    (बनेश्वर मंदिराची माहिती पुढील पोस्ट मध्ये)

     




                   We spend around an hour in the temple area and left for the drive. We took a small route which is just before Changa Vateshwar temple. Route change very scenic and full of curved in the lap of Sahyadri. We drive till Panvadi village. There is no huge waterfall but you can see some beautiful landscapes. You will not find any hotel in this area hence better to carry own food. After spending more than 2 hours on that route, we returned to Saswad-Bhor road.

    Road to Panvadi Village

    Green Nature

    Panvadi Village
    Panvadi Village

                 We had lunch at Hotel Kamat on Pune-Banglore highway. After lunch, we went towards Bhor. We visited Necklace river point. Due to river curvature, it looks like Necklace. This place was a popular destination for Marathi film shooting. It becomes more famous after showing in the Katyar Kalajat Ghusali film. As we wanted to reach home before sunset, we travel back home safely.

    Necklace River Point, Bhor
    Necklace River Point, Bhor

    There are few other places, which you can cover along with Saswad visit

    http://pritskulkarni.blogspot.com/2017/10/day-trip-to-saswad-and-nearby-places.html
    Thanks for reading this Travel Blog. Happy travelling. 

     

    As they say you look your best when you are free and on your holiday. So why not enjoy this holiday in a place that makes you feel like you have transported into a place that is so magical. Some place that makes you have a small taste of history. The Holiday resorts near Pune are many yet you will not find something that Fort Jadhavgadh has to offer.

    It’s nothing like you have seen before. With all its amenities you will not want to go back after your holiday is over. You are sure to make some of unbelievable and remarkable memories here. The amount of activities it offers is mind blowing.  What is a holiday without good food? Well the Fort offers you lip smacking food. With the aroma of wonderful food in the air will sure make you want to just sit there for hours.

    Not forgetting the views that you have at the fort. It has beautiful hills that surely makes up for a good backdrop for a photo session. If you are a photographer then there is no better place than this. With nature all around and the look of an historical palace you can experiment and get the best pictures you have ever clicked.

    Fort Jadhavgadh is always ready for anything you need. Here they believe in no limits so think ok it and you are surely going to get it. They always want to bring a smile to your face so don’t hold back and see what they have to offer.

    The holiday resorts near Pune waits to welcome you to its majestic sites luxuries. It’s one of the Heritage Hotels in India. So take a break this weekend, treat you and your family to a time of extravagance.  Enjoy the holiday resorts near Pune to enjoy and celebrate with your family. The Fort is years of history with tremendous and the experience is magnificent of the Maratha regime at Fort Jadhavgadh Hotel and Resort, it is Maharashtra’s only fort Heritage Hotels in India. It is one of the best holiday resorts near Pune. It is located just 22 km from Pune Mumbai; holiday resorts near Pune and in Pune as well it is the perfect weekend getaway or for a great place to host a grand celebration. Fort Jadhavgadh is not just a hotel but a place where you can lose yourself.

    This weekend escape for a while and enjoy freedom at Fort Jadhavgadh. A place that has unbelievable views and wonderful places to stay in with all you need form western toilets to wifi in your rooms. You just name it they have it. It’s a place where dreams come true. So come on down to Fort Jadhavgadh to experience this breath taking experience. They are always wanting to bring a smile to all their guest and as you leave you feel totally satisfied and want to come back for more. Fort Jadhavgadh a place where dreams do come true.


    सासवडचीये नगरी: लोणी भापकर 

    आता बारामती हायवेला लागलो. आणी सुसाट सुटलो.लोणी भापकरला वळण्याचा रस्ता चुकायला नको म्हणून MAP लावला आणी निघालो. येथून पुढे सुमारे २ वाजता पोहोचलो लोणी-भापकर.

    लोकप्रभा मध्ये आलेला अभिजित बेल्हेकर यांचा लेख वाचूनच लोणी भापकर ला जायचे नक्की केले होते. मोरगाव-बारामती रोड वरून एकदाचा "लोणी भापकर" फाटा दिसला आणी हुश्श केले. सुर्य डोक्यावर आलेला आणी पोटातही डोंब उसळलेला. फाट्यापासून सुमारे १५-२० मिनिटे गाडी हाकत गेल्यावर गावात पोहोचल्याचे सुतोवाच झाले. जरा वर्दळ दिसू लागली आणी त्यातच एका मंदिराचा कळस अगदी दूरवरूनही लक्ष वेधून घेत होता. तेच हे काळभैरवनाथ मंदिर. 

    काळभैरवनाथ मंदिर:-

    हे मंदिरही पुर्वाचीन असले पाहिजे असे आतमधील कातळकला बघून लक्षात येते. सद्यकाळात त्यावर रंगरंगोटी करून त्याचे नूतनीकरण (??) करायचा यत्न केला गेलाय.


    गाडी मंदिराच्या बाहेर लाऊन आमचा फापट-पसारा बाहेरच ठेऊन मंदिरात जाऊन बसलो. रखरखत्या उन्हातून एकदम दगडी मंदिरात गेल्यावर कमालीचा गारवा जाणवला. मंदिरात महिला पुजारी होत्या. भैरवनाथाला महिला पुजारी कश्या असे एकक्षण वाटले पण मी त्या गणिताचा उलगडा करायला आलो नव्हतो. नमस्कार करून, गुलाल उडवून, थोडा आजूबाजूला फेरफटका मारला.
    काळभैरवनाथ: 




    मंदिराच्या बाहेर दोन मोठ्या दगडी दिपमाळा आहेत . त्याने मंदिराचे रूप अजून खुलून दिसले. शेजारीच एक विहीर आहे. गाडी चिंचेच्या सावलीत दम खात होती म्हणून थोडा वेळ टीपी केल्यावर मंदिराच्या मागे गेलो.तेथे काही विरगळ होत्या. त्या बघून थोडे पुढे गेलो तर गावातल्या मुलांचा मस्त गोट्यांचा डाव जमला होता.
    एकाला सांगितले की तू लांबून उडव यातली एक गोटी आणी मी फोटो काढतो. मला वाटले खूप वेळ जाईल आणि बरेच फोटो काढावे लागतील. पण हा बघा पहिलाच शॉट. ताडी !!!
    एकाच गोटी उडवून स्ट्रायकर गोटी कोणालाही धक्का न लावता बाहेर निघून गेली. वा वा sss 


    भंकस झाली, गाडीही शांत झाली होती. मग निघालो मल्लिकार्जुन मंदिराकडे.
    अडीच च्या सुमारास येथे पोहोचलो. पूर्ण निर्जन असे स्थान माझ्या जोडीला मंदिरातील देव आणी काही श्वान लोक्स. येथे आल्यावर मात्र "आधी पोटोबा नंतर विठोबा" म्हणत डबे उघडले.
    कडकडून लागलेली भूक डबा उघडताच गोड शिरा पाहून अजून वाढली. आणले होते नव्हते ते सगळे मांडून खायला सुरवात करताच अजून २ श्वानांची कंपनी लाभली.
    मल्लिकार्जुन मंदिर :

    सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. - See more at: http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf
    सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. यातील सभामंडप पूर्वीच पडल्याने आपण थेट गाभाऱ्यापुढील विस्तीर्ण अंतराळात प्रवेश करतो. पण तत्पूर्वी प्रवेशद्वारावरील रत्न, रूप आणि स्तंभ शाखा आणि त्यातील निसर्ग रूपकांवर नजर टाकायची आणि तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरायचे. - See more at: http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf
    सभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि नागर शैलीतील विटांचे शिखर अशी या उत्तराभिमुख मंदिराची रचना. तळातील द्वारपालांची परवानगी घेत आत शिरताच, आता सभामंडप नसला कारणाने आपण मंदिरात प्रवेश करताच गाभाऱ्या पुढच्या जागेत येउन पोहोचतो. आता पुरेसा प्रकाश नसूनही फक्त आजूबाजूला बघण्यात आपण गर्क होऊन जातो. प्रत्येक भारवाहक खांबांवर केलेले मनसोक्त कोरीवकाम आणि त्यां शिल्पांचे संदर्भ समजावून घेता घेता आपण मध्ययुगीन इतिहासात हरवून जातो.


    ठिकठिकाणी कोरलेल्या कृष्ण-मुद्रा, कृष्ण-लिला, भारवाहक यक्षिणी व इतर अनेक अबोध अशी शिल्पे.


    शिवाच्या पायाशी डोक टेकवून आपण बाहेर पडतो तोच समोर दिसते विस्तीर्ण अशी पुष्करणी.


     पुष्करणीत पाणी नसल्याने आपोआप समोर लक्ष गेले ते म्हणजे कोरीवकलेच्या उत्कृष्ठ आविष्काराकडे. दगडी नंदी-मंडप.
    मंडपाच्या चारही बाजूने उत्कृष्ठ असे कोरीवकाम केलेले आहे. पौराणिक शिल्पे, कामशिल्पे आणी अनेक गज-शिल्पे.


    या मंडपात पूर्वी यज्ञवराह विराजमान होता असे तेथे नव्याने उपस्थित झालेल्या आजोबांनी सांगितले. आजोबा न विचारता मला माहिती पुरवत होते त्यावरूनच त्यांचा उद्देश्य माझ्या लक्षात आला. थोडी श्रवण-भक्ती करून मग फोटोभक्ती चालू केली.

    येथे एक मांजर होती ती सारखी माझ्या मागे मागे येउन पायात येत होती. तिच्या पेकाटात लाथ घालून हाकलून द्यावी वाटत होत. पुल म्हणतात तसे मांजर हा जगातला सर्वश्रेष्ठ उच्छाद आहे.

    यज्ञवराह पाहिला आणी वाटले ..... वाह ss याच साठी केला होता अट्टाहास. !!  

    आधी वाचलेल्या लेखांमध्ये हे शिल्प मंदिराच्या मागे झाडीत पडलेले आहे असे वाचले होते. पण त्या लेखांचा इफेक्ट कि काय म्हणून हे शिल्प मंदिराच्या सुरवातीलाच मोकळ्या भागात आणून ठेवले आहे.  
    मी निघतोय असे वाटून आजोबा पुन्हा प्रकटले. 
    हे शिल्प त्या पुष्करणीच्या नंदी मंडपात स्थानापन्न होते.त्यानंतर औरंगजेबाच्या आक्रमणात आणी युद्धात ज्या काही मंदिरांची आणी शिल्पांची भंजने झाली त्यात याचाही नंबर लागतो. भुलेश्वर येथील भंजलेल्या मूर्तींची आठवण झाली.  

    "त्या मुसलमानांनी ह्या मूर्तीचे त्वांड फोडून फ्याकून दिलेली झाडीत. इतक्या दिवस तिथेच पडून होती. गावातील लोकांनी आणलीये इथे काही दिवसांपूर्वी. ते उचलतय थोडी कोणाला? दोरी बांधून आणायला लागल तर हलेना जागच. क्रेन बोलावली मंग आणी क्रेनने उचलून आणून ठीवलाय इथे!"- इति आजोबा.

    "त्या काळचे ते मुसलमान म्हणजे" अश्या हरीतात्यांच्या आवेशात जात असतानाच यज्ञ वराहाच्या देखणेपणाने मला इहलोकी आणले.
    अडीच फुट उंचीच्या या वराहाच्या शिल्पाचे तोंड फोडलेले आहे पण त्याच्या पाठीवरील असंख्य विष्णुमूर्ती कोरलेल्या पाहून कारागिराच्या नाजूक हाताची कल्पना येते. पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल चढवलेली आहे. 

    या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहेत आणि मुख्य म्हणजे पाठीवर छोटय़ा-छोटय़ा तब्बल १४२ विष्णू मूर्तीची झूल चढवलेली आहे. - See more at: http://www.loksatta.com/trekit-news/loni-bhapkar-temple-in-baramati-1044948/#sthash.JTREhOTl.dpuf


    या वराहाच्या पायाशी शेष कोरलेला आहे. तर चार पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत. पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहे.
    पायाखाली दबलेली गदा आणि दोन पायांमध्ये हात जोडून असलेले मानवी मुख असलेली शेष-रुपी शिल्प , वाराहाने शेषावर मिळवलेल्या अधिपत्त्याची जाणीव करून देतो.


    वराहाच्या शेपटीत पृथ्वी गुंढाळलेली आहे असे एका लेखात वाचलेले होते.

    बरेच फोटोसेशन झाले. नाऊ टाईम टू गो होम !!

    मी निघत असलेले बघताच सावलीत झोपलेले आजोबा पुन्हा प्रकटले आणी त्यांनी "काही" मदत करा म्हणताच माहितीचे प्रयोजन कळले. त्यांना यथाशक्ती मदत करून, तेथीलच एका मोठ्ठ्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडून घेतल्या भाच्चीसाठी.

    आता गाडीला टांग मारून परतीच्या मार्गाला लागलो. येताना दिवे घाटातून जावे का असा विचार करता लगेच सोनोरीचा किल्ला/ मल्हारगड आठवला. वेळही हातात होता. आणी किल्लाही छोटेखानी होता.

    सासवडची फ़ेमस अंजिरे येताना लक्ष वेधून घेत होती. थोडी घासाघीस करून १ किलो अंजिरे घेतली. पुढे ट्रेक करायचा आहे हा विचारच नव्हता. घरी येउपर्यंत त्यांचे पानिपत झालेच होते. असो. दिवे घाटाच्या अलीकडे एका टपरीवर सोनोरी विचारले आणि फाट्यावरून उजवीकडे गाडी वळवली.

    http://sagarshivade07.blogspot.com/2016/01/blog-post_9.html

    बारामती : शिलालेखामुळे पणदरेच्या इतिहासाला उजाळा

    Akshay Mandlik

    बारामती; पुढारी वृत्तसेवा : पणदरे (ता. बारामती) गाव ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखले जाते. गावातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, शिलालेख हे इतिहासाची साक्ष देतात. शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी नुकतेच केले. त्यामुळे गावच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. शिलालेखानिमित्त पणदरे व येथील जगताप घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे.

    शिलालेख वाचनासाठी दुधाने यांना बारामती परिसराचा इतिहास उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या विनोद खटके व मनोज कुंभार या विद्या प्रतिष्ठानच्या दोन शिक्षकांचे सहकार्य मिळाले. याशिवाय राम वाघोले ,अनिकेत राजपूत, राहुल भोईटे यांचीही मदत झाली. पणदरेत मुख्य गावठाणात श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख कोरला आहे. तो उठाव स्वरूपाचा असून, सात ओळींचा शुद्ध मराठी भाषेत मजकूर आहे. शिलालेखाची अक्षरे ठळक असून, सुस्पष्टपणे वाचता येतात.

    त्यावर रविवार, 13 मार्च 1774 या दिवशी श्री सोमेश्वर महादेव चरणी तत्पर असलेल्या सुपे परगण्यातील मौजे पणदरे येथील गावाचे पाटील महादजीचा त्याचा पुत्र गिरजोजी पाटील त्याचा पुत्र जानराव पाटील जगताप यांचा घुमट बांधला, असा उल्लेख आहे. जानराव पाटील यांचा हा घुमट (समाधी) आहे. पण हा समाधी घुमट नक्की कोणी बांधला याची माहिती शिलालेखात नाही. घुमट बांधल्याची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने तो कोरला आहे.

    जगताप घराण्याचा ऐतिहासिक वारसा
    सुपे परगण्यात मोकदम पाटील महादजी यांच्याकडे पणदरेची पाटीलकी असल्याचेही यावरून स्पष्ट होते. हे घराणे शिवपूर्वकालापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी चिंचवडचे मोरया गोसावी यांना पणदरे गाव इनाम दिल्याचे 1649 चे पत्र उपलब्ध आहे. पुरंदरच्या लढाईत किल्ल्याच्या पायथ्याशी जी लढाई झाली त्यात मुसेखान गोदाजी जगताप यांच्याकडून ठार झाला, तर फत्तेखान बेलसरकडे पळून गेला. त्या लढाईत नंदाजी जगताप शिवरायांकडून लढले असा उल्लेख आहे.

    सुप्याच्या पाटीलकीच्या वादाबद्दल शिवाजी महाराजांनी जगतापांची कानउघडणी केली ते 6 मार्च 1676 पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजेश्री रामोजी जगताप व खंडोजी जगताप यांचे नाव आलेले आहे. येथील कोकरे (धनगर) व जगताप (मराठा) यांच्याकडे छत्रपती शाहू व पेशवाईत निमपाटीलकी राहिली. शहाजीराजे यांच्या जहांगिरीतील सासवडमधील 10 गावांची देशमुखी जगतापांकडे होती. त्यात बारामती परिसरातील होळ, मुरूम, वाकी, वाणेवाडी, पणदरे आदींचा उल्लेख आहे.

     https://pudhari.news/maharashtra/pune/456494/illuminate-the-history-of-panadare-with-inscriptions/ar

     



    सरदार रणनवरे घराणे..
    निमसाखर ता.इंदापूर जि.पुणे
    येथील त्यांचा..
    "राजवाडा"
    सरदार रणनवरे यांचे राख कर्यात सासवड हे मुख्य गाव आहे. निंभोरे, जिंती व निमसाखर व इतर गाव आहेत. फलटण निंभोरे ऐतिहासिक संदर्भ आहेत यांचा खर्डा पानिपत कोकण मोहीम अशा अनेक ठिकाणी मोठे उल्लेख सापडतात.. सातारा छत्रपती यांचे निष्ठावंत म्हणुन यांची ख्याती होती.
    सुलतानजी, आप्पाजी, सेट्याजी इ. रणनवरे मंडळींचे इनाम व वतन उल्लेख आहे.
    हा वाडा पाहिल्यावर याची भव्यता आपल्याला लक्षात येते.
    जवळपास ४ एकर मधे पडिक अवस्थेत असलेला हा रणनवरे सरदारांचा वाडा आज शेवटची घटका मोजत आहे.
    याची विषेशता म्हणजे...
    वाड्याला भव्य असे प्रवेशद्वार तटबंदी असून, या वाड्याला एकूण ६ बुरूंज पडिक अवस्थेत आहेत.
    तसेच
    वाड्याच्या आतमध्ये एक भुयारी मार्ग व बारवा होत्या, परंतु आज त्या पहायला मिळत नाहीत.
    कारण वाड्यामधे सद्ध्या गावचा अठावडे बाजार भरत असल्याने आतील पुर्ण भाग हा सपाट केलेला पहायला मिळतो आहे.
    तसेच वाड्याच्या बाजूला सरदार जिवाजीराव सुभानजीराव रणनवरे सहपत्नीक अशा शिवकालीन समाध्या आहेत.
    असा हा भव्यदिव्य स्वरूपात असणारा
    सरदार रणनवरे घराण्याचा "राजवाडा" आज पाहण्याचा योग आला.
    साभार अक्षय रनवरे

     
    मराठा सरदार भिकाजीराव काकडे देशमुख हे मुळचे बारामती निंबुत भागातील असुन छत्रपती सातारकर शाहु काळात त्याना बीड, परभणी व नगर जिल्ह्यातील या भागातील सरंजाम होता. हे सरदार सूर्याजी काकडे यांचे वंशज पैकी होत.
    काकडे पराक्रमी असे मातब्बर मराठा घराने. यांचे मुळ गाव पांगारे जे सासवड जवळचे किल्ले पुरंदर च्या मागील बाजूस आहे.
    पुढे पेशवे काळात सरदार काकडे याना कोराइगड ची किल्लेदारी अन पाटिलकी होती.
    पुढे ग्वाल्हेर येथील मराठा सरदार महादजी शिंदे यांचे सोबत काही घराणी तिकडे स्थाईक झाली.
    काकडे देशमुख (बोरखेड) जिल्हा बीड इथली गढी.
    माहीती विशाल बर्गे बारामती.
    फोटो साभार आशिष शिंदे



    आता एका छोट्या आणी उजाड अश्या रोडवर मी एकटाच चाललो होतो. मागे, पुढे, समोर कुठेही चीटपाखरूही दिसेना. तसचं संभ्रमित पुढे गेलो मग एक मामांना लिफ्ट दिली त्यांनी रस्ता समजावत भर गावात आणून सोडले. तेथून निघालो मल्हारगडचा बेस


    भुलवून टाकणारे सौंदर्य: दौलत-मंगळ भुलेश्वर
    बरेच दिवस समाधी अवस्थेत असलेल्या ब्लॉगला आज काही प्रमाणात संजीवनी मिळेल असे वाटत आहे. मनात साचलेले खूप आहे पण खरडायला काही वेळ मिळत नाही. नवीन नोकरी आणि कांदे-पोहे कार्यक्रम या दोन्ही गोष्टी अश्या काही मानगुटीवर बसल्यात की गुडघे पार दुखून जातात. ( यातले कोणाला किती कळले माहित नाही,मला काहीच कळले नाही असो. )
    इतके कांदे-पोहे खाऊन दर रविवारी इतका पकलो आहे कि बास आता म्हणून मी घरातून जवळपास पळूनच गेलो काल. आणि गेलो ते डायरेक्ट सौंदर्य नगरीत.मूक सौंदर्य, शिल्प सौंदर्य, शब्दशहा भुलवून टाकणारे सौंदर्य! कमाल !
    बरेच दिवस येथे जायचा मानस होता पण भूषण पुण्याला येणार मग आम्ही जाणार असा योग काही जुळत नव्हता. आज तो सकाळीच ९ वाजता शिवाजीनगर ला उपस्थित झाला आणि मग गाडीवर दोघेच चालू झालो.
    पुण्याहून खाली सासवड, इंदापूर भागात बरेच काही बघण्यासारखे आहे. इंदापूर हे गाव कायम मला अवर्षण ग्रस्त गाव वाटायचे का काय माहित.
    खाली नकाशात गोल केलेले बघितले तर एका दिवसात फिरायला बरेच काही आहे. एक दिवस मंदिर स्पेशल ठेऊन थेउर, भुलेश्वर, जेजुरी, मोरगाव, लोणी भापकर, पांडेश्वर, बसवेश्वर अशी बरीच प्राचीन वा जुनी मंदिरे पाहता येतात. एक ट्रीप मारून एक मंदिर बघितले तरी ते वर्थ आहे. पांडवकालीन, हेमांडपंथी पद्धतीने बांधलेली ही देवालये आणी त्यातली शिल्पकला,स्थापत्यकला केवळ अद्भुत आहे.

    तर आमचा प्लान होता पुणे-> यवत-> भुलेश्वर->माळशिरस-> पांडेश्वर-> सासवड->पुणे. आणी ते पण बाईक वर. "माझ्या बाईकची दोन्ही चाके फिरतात आणी ब्रेक लावला की थांबतात." असा एका वाक्यात तिच्यावर निबंध होऊ शकेल. असो.
    यवत पासून उजवीकडे एक फाटा फुटतो. रस्त्यावरच भुलेश्वर मंदीर अशी पाटी लावलेली दिसते. पुण्यापासून यवत ५५ किमी आणि तेथून बोपदेव घाटातून भुलेश्वर १५ किमी.बोपदेव घाट संपला की लगेच एक फाटा फुटतो तेथून उजवीकडे भुलेश्वर मंदीर.
    बोपदेव घाटाचा परीसर फोटो काढायला फार मस्त आहे सध्या. ( आम्हीही काही दाखवायचे फोटो काढून घेतले हेही जाता जाता) 
    मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा ढग भरून आलेच होते. मस्त हिरवागार,निर्जन परिसर, हलकासा पाऊस. मजा आली. हलकाश्या पाऊसात निवांत गाडी चालवत गप्पा टप्पा करत चाललो होतो. एखाद दुसरी दुधाची गाडी ये जा करत होती.
    एवढा पाऊस पडून, संपूर्ण प्रदेश हिरवागार होऊनही याच्या नशिबात नव पालवी नसावी. वार्धक्याच्या खुणा सोसतच काही आयुष्ये सुखाला समांतर जातात.

    येथून सरळ गेले की माळशिरस गाव आणी डावीकडे बोपदेव घाट.
    पाऊस थांबला तसे आम्ही मंदिरात पोहोचलो. गणपतीचे दिवस असल्याने गर्दी जास्त नव्हती. मंदिराच्या कळसाची डागडुजी चालू असून शिल्पांना चुनकळीच्या रंगाने लेप देण्याच्या प्रकार सुरु आहे असे समजले. जो माणूस हे सांगत होता त्याच्या मित्राने सगळे ऐकून एकाच प्रश्न विचारला. "जमणार आहे का पण आपल्या लोकांना हे?"
    तेही खरच आहे म्हणा,कारण इतके बारीक आणी तपशिलात हे कोरीवकाम केलेले आहे की त्याचे कोटिंग करणे पण सोपे काम नाहीये. असो.
     
    इतकी वर्षे स्वतःचे अस्तित्व जपून उभे असलेले हे मंदिर म्हणजे दौलत मंगळ किल्ल्याचा भाग आहे. किल्ल्याचे प्रवेशद्वार ढासळलेल्या अवस्थेत असून पायरी वाटेने आल्यास त्याचे अवशेष दिसतात.

    बाकी एक भलामोठा बुरुज आणी एक मोठे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीत आहे.
    आता येथून सुरु झाली ऐतिहासिक शिल्पांची अद्भुत सफर आणी स्थापत्यकलेच्या सौंदर्याची मुक्त उधळण.
    कॅमेरे सरसावून, बूट काढून दोन पाऊले चाललो तेवढ्यात पहिल्याच प्रवेशद्वारापासून अत्यंत सुबक आणि प्रेक्षणीय शिल्पांचे दर्शन घडले. निव्वळ शब्दातीत.
    हत्तीवर आक्रमण करताना वाघ्र शिल्प.

    प्रवेशद्वारावरील द्वारपालाचे शिल्प.
    या शिल्पाच्या चेहेर्यावरील भाव किती मंद, शांत आणि हळुवार आहेत नाही? कसा तृप्त वाटतो चेहेरा. कानात कर्णफुले आणी मुगुट.

    ऐरावातावळ

    प्रत्येक शिवमंदिरात प्रवेशद्वाराशी कासव का असते याचा अभ्यास करायला हवा. मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी पण सोमेश्वर मंदिरात असेच कासव होते.

    मंदिरात प्रवेश केला आणी एकदम यादवकाळात गेलो. ऐतिहासिक श्रीमंती म्हणजे काय ते क्षणा क्षणाला कळत होते. मंदिरात पूर्णतः काळोख आणी काही ठिकाणी केलेली नैसर्गिक प्रकाशव्यवस्था.

    महानंदी
    मुख्य मंदिरात प्रवेश करताच प्रथम दर्शन झाले ते महानंदीचे. मंदिराच्या मुख्य मांडवात हा भलामोठा नंदी शिवमंदिराच्या गाभारयामुख आहे. प्रत्येक अन प्रत्येक खांब पौराणिक दृश्यांच्या शिल्पाने कोरलेले आहेत. मंदिराचा एकाही भाग असा नाही ज्यावर काही कोरलेले नाही. एवढे बारीक डिटेल काम पाहून डोके चक्रावून जाते.
    महाभारतातील अर्जुन-कर्ण युद्धाचा प्रसंग.
    युद्ध दर्शवताना हवेत मारलेले बाणही स्पष्ट दिसतात.





























    किल्ले पुरंदर 🏰
    ०८:३० वाजता पुरंदर किल्ल्यापाशी येऊन पोहचलो पण किल्ला भारतीय सैन्याचा ताब्यात असल्यामुळे १०:०० वाजता पर्यटना साठी चालू झाला. आधिच कडक उन्हाळा म्हणून लवकर आलो होतो पण शेवटी ट्रेक उशीरा चालू झाला. नोंदणी करून सैन्याचा ताब्यात माझा कॅमेरा ठेऊन आम्ही किल्याचा दिशेने पुढे चालू लागलो. सुरवातीला माची वरती असलेले पद्मावती तलाव, चर्च, मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक व समाधी मंदिर, बिनी दरवाजा, महादेव मंदिर, मसनी विहीर, रामेश्वर मंदिर व पुरातन असे पुरंदरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर पाहीले. माची वरून सर्व पाहात जातांना वरील दिशेला किल्याची तटबंदी स्पष्ट दिसत होती. पुरंदर किल्ला हा छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान. गडावरील पुरंदरेश्वर मंदिरा पासून जवळच आता छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व उद्यान उभारले आहे. 

    मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक व मागे पुरंदर किल्ल्याची तटबंदी
    मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक व मागे पुरंदर किल्ल्याची तटबंदी 
    चर्च - किल्ले पुरंदर
    चर्च - किल्ले पुरंदर
    बिनी दरवाजा - किल्ले पुरंदर
    बिनी दरवाजा - किल्ले पुरंदर
    पुरंदरेश्वर मंदिर - किल्ले पुरंदर
    पुरंदरेश्वर मंदिर - किल्ले पुरंदर
    पुरंदरेश्वर मंदिरा जवळील हनुमान मंदिर - किल्ले पुरंदर
    पुरंदरेश्वर मंदिरा जवळील हनुमान मंदिर - किल्ले पुरंदर

    छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व उद्यान - किल्ले पुरंदर
    छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व उद्यान - किल्ले पुरंदर

    स्मारका पूर्वी उजवीकडे वळून आता बांधून काढलेल्या काही पायऱ्यांची वाट व पुढे थोडी घनदाट झाडीतून जाणारी चढाईची वाट चालत आलो. तेथून पुढे तुटलेल्या जुन्या दगडी वळणदार पायऱ्यांचा वाटेने समोर आल्या नंतर किल्याचा मुख्य दरवाजापाशी आलो. या पहिल्या दरवाजाचा अगदी समोरील तटबंधी मध्ये हनुमानाची मूर्ती स्थापित केलेली पाहायला मिळाली. पहिल्या दरवाजानंतर डाविकडे एक वाट कंदकड्याकडे जाते पण ती वाट भारतीय सैन्यानि बंद केली आहे. पहिला दरवाजा पार करता समोर आणखीन दोन दरवाजे पाहायला मिळाले. असे तिन्ही दरवाजे पारकरून आम्ही किल्या वरती प्रवेश केला. बाजूला असलेला बुरुज, भग्न अवस्थेतील वाड्याचे अवशेष, तलाव, विहीर असे पाहून पुढे चालू लागलो. 

    मुख्य दरवाजा - किल्ले पुरंदर
    मुख्य दरवाजा - किल्ले पुरंदर
    मुख्य दरवाजा येथील वळणदार दगडी पायऱ्यांची वाट - किल्ले पुरंदर
    मुख्य दरवाजा येथील वळणदार दगडी पायऱ्यांची वाट - किल्ले पुरंदर
    मुख्य दरवाजा येथील हनुमान मंदिर - किल्ले पुरंदर
    मुख्य दरवाजा येथील हनुमान मुर्ती - किल्ले पुरंदर
    दरवाजा - किल्ले पुरंदर
    दरवाजा - किल्ले पुरंदर
    कंदकडा  व मागे वज्रगड - किल्ले पुरंदर
    कंदकडा व मागे वज्रगड - किल्ले पुरंदर

    वाड्याचे अवशेष  - किल्ले पुरंदर
    वाड्याचे अवशेष  - किल्ले पुरंदर
    पाण्याचे टाके - किल्ले पुरंदर
    पाण्याचे टाके - किल्ले पुरंदर

    पुढे वाटेत असलेले पाण्याचे टाके पाहून दुपारचा रखरखत्या उणा मध्ये केदारेश्वर मंदिराचा दिशेने चालू लागलो. वाटेमध्ये एका करवंदीच्या झाडा जवळ करवंद खात सावलीला थोडी विश्रांती घेतली. मंदिराचा दिशेने जातांना डाव्या बाजूला खालील दिशेला केदार दरवाजा, पायऱ्या व दूरवर एक बुरुज दिसत होता. पुढे मंदिराचा आधी असलेल्या दगडी पायऱ्या व बाजूने तटबंधी आज देखील खूप सुंदर व सुस्थितित पाहायला मिळाल्या. केदारेश्वर मंदिरा समोर ४ खांबी लहानशा मंडपा मध्ये नंदी, गाभाऱ्या मध्ये शिवलिंग, गाभारा व पूर्ण मंदिर दगडी बांधकामामध्ये तर छता वरती आज देखील जुनी कौले पाहायला मिळाली. मंदिरा मध्ये थोडी विश्रांती घेतली व पेटपूजा करून गड उतरायला सुरवात केली. पुरंदर किल्ला पाहताना गडाला लागूनच असलेला वज्रगड किल्ला आम्हाला खुणावत होता, पण भारतीय सैन्यांना विचारणा केली असता वज्रगड वरती जाण्यास आता बंदी आहे असे सांगितले. साधारण १:३० वाजता आम्ही गाडी पाशी येऊन पोहचलो व पुढे सासवड कडे निघालो.

    केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर
    केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर

    केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर
    केदारेश्वर मंदिरा जवळील पायऱ्या - किल्ले पुरंदर
    केदारेश्वर मंदिर - किल्ले पुरंदर
    केदारेश्वर मंदिर - किल्ले पुरंदर

    Purandar fort in Monsoon

    After Lohagad and Tikona fort, it was time to do one more trek. Very heavy rainfall started around Pune so we thought better to go for an easy and safe trek.We preferred bike journey rather than a car to enjoy the monsoon.

    Trekkers for Purandar were me and my wife Renuka

    Bini Darwaja

    About Purandar fort:
                 Purandar fort stands 4,472 ft. above the sea (1,387 m) in the Western Ghats, 52 kilometres southeast of Pune.The fort was a good place for defence. It had the capacity to house many soldier-troops, foods grains and ammunition which proved sufficient for long durations during wartime. Nonetheless, the fort hosts strongly fortified places from which a watchful eye can be kept over surrounding areas.History says that Purandar was from Yadava’s era. The 1000 yr. old Narayaneshwar temple of Hemadpanthi architecture built by the Yadava’s still exists in Narayanpur, the base village of Purandar.
    This fort witness many more historical events like famous Treaty of Purandar in the year 1665, Shivaji Maharaja’s eldest son and successor was born at Purandar fort.I will share some history of Purandar fort on the blog.

                To reach on Purandar, there are two routes. One is from Hadapsar – Saswad route and another one is from National highway 4. I went via the second route which is Pune – Waraje – National Highway 4 (Towards Kolhapur side) – Cross first toll plaza – Cross Nasarapur (do not take any turn at Nasarapur) – After driving for few km, Take left at Kapurhol (on NH4) – Narayanpur village – Cross Narayanpur village and after 1 km take right turn for fort which is opposite to Petrol pump.
                By personal vehicle, you can go to fort directly (to avoid 1 hr. trek) and then you can explore the fortification. As we were on our trek, we decided to do a trek from the base.

    21st July 2013: Trek to Purandar fort (Total Distance travelled: 105 km):
                We woke up early morning by 7.30 am and left Pune by 8 am. When we reached on National highway, rain god welcomed us with a heavy shower. Due to bike journey, we reached at the base village after 1.5 hours of wonderful rainy drive. We reached the base village, and the entire fort was covered with cloud. Many villagers told us to go up on the bike and why to waste your time to climb the fort. Few of them warned us that route will be muddy and slippery so take proper care while climbing.

    Starting point of Trek route

                After our short discussion, we came up with the option to trek rather than drive. Also, safety is the most important part of trek so we decided that if anyone from us feels the trek route is not safe, we will turn back. It was raining so I was not able to capture any photos. In fact most of the time on the trek, my camera was in the bag due to heavy rain. Initial part was ok but after few min, we started facing problem to climb. Not because of difficulty level but due to mud and slippery path. The rain was causing a continuous cascade of water on the trail; it was pretty slippery at times, but it was fun. Every time we were searching for an alternate route to avoid slippery route. Renuka did a great job even though she is not experiencing trekker. Once halfway through, the muddy route turned into deep forest climbing route. It was a thick maze of bushes, which was pretty cool. I think we were the only 2 trekkers for the entire path. At the end of the trek, our track pants were a slushy mess.

    Forest Path

                After few min, we reached the wall. We took a left turn here for the fort. Fort direction is marked on the wall with paint. From this point, it’s a steady climb till the top. There is also a small waterfall on this route where you can get wet if you feel that rainwater is not enough to wet you in the monsoon. After climbing on last rocky steps stretch, we reached Bini Darwaja. We reached this point in just 50 min. The door is in good condition even today. As one enters through the door, there are provisions for the guards to hide and attack the enemy. These are called as the Gatehouses. Once you enter through the door, the road branches, and one straight ahead whereas the other towards the rear ends of the fort.

    Way to Bini Darwaja

    Walk towards Bini Darwaja

                We moved ahead to the fort after taking a small halt. We saw an abandoned church walking on the road. This church was built by British after the fort was captured by them in 1818. You can see some other structures and houses which are belong to the Indian military. This fort is a training center of Indian Military. After a km walk on road, you will find signboards for the fort area. There is small check post set up by military. It is mandatory to enrol your name and other details. Sometimes they ask for Identity card just to cross check your details.

    Church

               From this point, our second half of trek begins. It was a simple route to climb. We were constantly in the cloud and in heavy rain. It was too difficult to take any photograph. Due to the clouds, we were not able to see surrounding view but weather was very pleasant. On this route, we saw few bastions, old-time water tanks and some fortification. This route goes to Kedareshwar temple which was our final destination. It took us around 1 hour to reach at the temple.

    Steps for Kedareswar temple

    Kedareshwar

                Before I write further, I would like to share some history about Purandar fort. In 1596, when Bahudar Shah of Ahmednagar sultanate granted Maloji Bhosale (grandfather of Shivaji) Poona (Now Pune) and Supa, the fort of Purandar was included as well. In 1646, a 19-year-old Shivaji in one of the first victories of his legendary career established control in the fort.
               In 1665, it was besieged by the forces of Aurangzeb, under the command of Mirja Raja Jai Singh, a Rajput general, assisted by Diler Khan, an Afghan. The defence of Purandar by Murarbaji Deshpande of Mhar, the killedar (keeper of the fort) was obstinate and he lost his life in the struggle to retain the fort. Diler Khan, impressed with the bravery of Murarbaji, offered him a truce and employment in the Mughal forces with a handsome salary. Murarbaji turned down the offer due to his loyalty to the ideals of Hindavi Swarajya. He was extremely enraged at this very suggestion and in an act of extreme daredevilry charged with his commando’s right into the heart of the Mughal troops, killing hundreds. Diler Khan was so much impressed with Murarbaji that after his death he said, such this warrior was blessed by God Alha ("असा शिपाई खुदाने पैदा केला.").

    Murarbaji Deshpande (Photo taken from Wikipedia)

                Dilerkhan was marching upwards from all directions on to the Purandar fort. However, first Vajragad was lost and later inspite of a valiant performance by Murarbaji’s troops, the fort of Purandar fell into the hands of Moguls. Raja Shivaji daunted at the prospect of the fall of his grandfather's fort, signed a treaty (the first Treaty of Purandar) with Aurangzeb. Purandar fort along with Vajragad, Sinhgad and 22 other forts came under the Aurangzeb's control and ShivajiRaje became his jahagirdar (glorified tenant). This truce did not last long as Shivaji revolted against Aurangzeb and recaptured Purandar only five years later in 1670. Thereafter, Shivaji spent prolonged periods of time here. Sambhajiraje, Shivaji Maharaj's eldest son and successor was born at Purandar fort.
               Later, after the death of Sambaji Maharaj, Aurangazeb conquered the fort and renamed it as ‘Ajamgad’. Again, on behalf of Marathas, Shankarji Narayan argued with Mughals and took control of the fort. Subsequent to that, in 1695, Chhatrapati Shahu Maharaj handed over the reign of the fort to Peshwas. It was the capital of Peshwas for many years then. Shake’ 1697, i.e. 1775, marked the birth of Sawai Madhavrao. In the year 1818, British took the charge of the fort.
                Back to our fort journey, we had our packed our lunch in the temple. It was raining too heavily and it was difficult to stand still in the windy weather. A group of 8 people along with their 7-8 small children offered us Pithale bhakari and Mirchi Thecha (smashed chillies dish) which they brought. It was very delicious food. After a short break, we left the temple area. Within a 30 min, we came to the military check post. While walking towards the parking area, we saw the statue of Murarbaji Deshpande which was established in 1970.We wanted to avoid the same route for descending the fort due to the slippery condition. We asked Army people for help and they arranged 1 vehicle to drop us at the base where we parked our vehicle. By the way, you can get Auto from the parking area but it depends on availability which is rare. Or you can take an Auto number before you start your trek. From the base, we came home safely on our bike by 6 pm.

    Things to carry for Purandar trek:

    • A water bottle to carry at least 2 litres of water
    • Some dry food, in case you didn’t find any suitable food stall 
    • Windcheater/jacket / Barsati during monsoon trek.
    • Do carry instant energizers like Glucon-D or Tang.
    • A towel or napkin and 2-3 old newspapers
    • Camera to capture best nature movement
    • Better avoid wearing Gold and other ornaments. No need to carry heavy cash.

    Our Expenses:
    • Bike petrol: INR 150/- (approx. 2 lit at INR 74.5/lit)
    • No Expenses on food as we were caring food from home.
    Due to rain, I was not able to post any good photos. I will surely visit this fort for Photography somewhere in this winter.
    Thanks for reading this Travel Blog. Happy travelling.

    पानसे वाडा प्रवेशद्वार 
    सरदार पानसे पेशव्यांच्या तोफखाण्याचे प्रमुख होते. इ.स. १७५७ ते १७६० या काळात पानसे यांनी मल्हारगड बांधला. मल्हारगड, महाराष्ट्रात सर्वात शेवटी बांधला गेलेला किल्ला आहे. दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. मल्हारगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सोनोरी गावात पानसे यांचा वाडा आहे. सोनोरी गावात शिरताच दोन भरभक्कम बुरुजात बांधलेलं प्रवेशद्वार नजरेस पडत व त्याला लागून असलेली तटबंदी. वाडयात गजाननाचे व लक्ष्मीनारायणाचे सुंदर मंदिर आहे. सभामंडपातून गाभाऱ्याकडे जाताना देवडीत रथावर आरूढ असणाऱ्या देवतेचं शिल्प पहायला मिळतं. 

                                     लक्ष्मीनारायण मंदिर

    हि देवता म्हणजे सूर्यदेव. वेदांमध्ये सूर्यला आत्मा म्हंटले आहे तर यजुर्वेदामध्ये चक्षो सूर्यो जायत म्हणजे भगवंताचे डोळे. वेदकाळात प्रथम मंत्रा द्वारे सूर्याची पूजा केली जात असे यानंतर मूर्ती व त्यानंतर सूर्याची मंदिरे बांधली गेली. पुराणात सूर्य हा ऋषी कश्यप व आदितीचा पुत्र म्हणून उल्लेख आहे. सूर्याला छाया व सज्ञा या दोन पत्नी आहेत. शनी,यम, अश्विन कुमार व यमुना नदी व महाभारत मधील कर्ण हे सूर्याचे पुत्र पुत्री आहेत. सूर्याच्या मूर्तीचे दोन प्रकार पहायला मिळतात एक रथावर आरूढ असलेली सूर्यदेवाची मूर्ती तर दुसरा दोन्ही हातात कमळ घेतलेली मूर्ती. या मंदिरात रथावर आरूढ असलेली मूर्ती आहे. ज्यात रथाला सात घोडे व सारथी अरुण तर एक हात मुद्रेत व दुसऱ्या हातात कमंडलू असलेले ध्यानस्थ सूर्यदेव आहेत.

    सूर्यदेव 

    मंदिर पाहून मंदिराच्या मागे असलेल्या प्रवेशद्वाराने आत गेलो. तिथं काही खोल्या दिसल्या, आतमध्ये एक आज्जी होत्या आम्हाला वाटलं असंच आल्या असतील पण या आजी इथंच वास्तव्याला आहेत त्यांना विचारून आतमध्ये गेलो. आत बऱ्यापैकी बांधकाम शिल्लक आहे. दगडीतळखडे व त्यावर लाकडी खांब लावून छत उभारलं आहे. तिथेच कारंज सुद्धा आहे. उजव्या हाताला तीन खोल्या आहेत त्यांना कुलुपं होती तर डाव्या हाताला एक खोली आहे तिथं या आज्जी रहात असत. आजींसोबत गप्पा मारत काही काळ तिथंच थांबलो. ह्या वाड्यात या आज्जी एकट्या राहत होत्या तर बाकीचे कुटुंबीय सगळे पुण्यात रहायला होते.

    पानसे वाडा 

    आपल्या पूर्वजांचा वारसा सांभाळत या अज्जी इथच रहात होत्या पण ह्या पडक्या वाड्यात एकटं राहणं थोडं हॉररच वाटत होत. सहा बुरुजांची तट बंदी असलेला हा वाडा झाडी झुडपांनी वेढलेला आहे, काही ठिकाणची तटबंदी ढासळलेली आहे. वाड्याकडे सहसा कोणी फिरकत नाही त्यामुळं हा वाडा दुर्लक्षित आहे. वाड्यापासून थोडं पुढं एक बारव आहे. जुन्या काळात बांधलेली दगडी बारव आहे. पाणी उपसणायसाठी इथे अगोदर मोट होती त्याचे अवशेष पहायला मिळतात. गावकरी पिण्यासाठी इथल्याच पाण्याचा पाण्याचा वापर करतात. दहा वाजत आले होते रविवारी सुद्धा आम्हाला टाईम लिमिट असल्यानं सकाळी १० पर्यंत सगळं उरकत घेऊन निघालो. आज सासवड मधील पुरातन मंदिर व पानसे यांचा वाडा झाला.

    बारव 

    सासवड नगरी म्हणजे निसर्गसौंदर्यानी, ऐतिहासिक वास्तूनीं, साहित्यकांच्या लेखणीनं, स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाने नटलेली प्राचीन नगरी म्हणजे सासवड. रविवारी बाहेर नाही पडलं तर पुढचा आठवडाभर काही तर राहून गेल्यासारखं वाटत राहतं त्यामुळं दिवस सार्थकी लागल्याचं समाधान घेऊन पुढच्या रविवारची वाट बघत घराकडं निघालॊ, असा हा विक्याचा व माझा संडे भटकंतीनामा.

    भटकंती दिनांक २८/०७/२०१९
    सासवड मधील पुरातन मंदिरे व पानसे वाडा 





    गणराय 

    पानसे वाडा 




    बुरुज व त्याला लागून असलेली तटबंदी 


    https://maheshnilangekar.blogspot.com/2020/04/blog-post_7.html

     











    तोफखाना प्रमुख सरदार पानसे
    आज सोनोरी गावी जाण्याचा योग आला, सरदार पानसे यांच्या वाड्याला भेट दिली, वाड्याची खूपच पडझड झालेली आहे, काही अवशेष शेवटची घटका मोजत आहेत. वाडा जतन होणे आवश्यक होते. वाड्यात पानसे काकी भेटल्या, त्यांनी काही माहिती हतबल होऊन दिली. वाड्यातील काही भाग सुस्थितीत आहे, तिथे त्या राहतात. सरदार पानसे यांचे पूजेतील देवघर अजून सुस्थितीत आहे. सरदार पानसे यांचे वंशज यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तसेच गावकर्यांनी सुद्धा अनमोल इतिहास जतन करणे आवश्यक आहे.
    साभार परशुराम जगताप देशमुख. सासवड



    मल्हारगड
    माणसाने इतकी प्रगती केली आहे कि आता गाडी मल्हारगडचा तटबंदी जवळ जाते. असो,  बुरुजामधून जाणाऱ्या चोर दरवाजाने आम्ही किल्ला मध्ये प्रवेश केला. समोरच किल्ल्याचा मधोमध चौकोनी बांधलेला बालेकिल्ला दिसतो. तर तेथेच एक कोरडी विहीर पाहायला मिळाली. त्या समोर बांधीव तलाव व तेथूनच एका लहान दरवाजामधून बालेकिल्ला मध्ये प्रवेश केला. बालेकिल्ला मध्ये वाड्याचे अवशेष, खंडोबा मंदिर व महादेव मंदिर पाहायला मिळाले. तेथूनच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजातून बाहेर आलो व समोर असलेल्या काही पायऱ्या उतरून किल्याचा मुख्य दरवाजा पाहिला. या दरवाजातून येणारी वाट हि सोनोरी गावकडून येते. दरवाजातून माघारी तटबंधी वरून चालत झेंडेवाडी कडील आणखीन एका दरवाजातून किल्ला बाहेर आलो. व समोर असलेल्या टेकडीवरील ध्वजस्तंभाजवळ जाऊन बाहेरून किल्ला पाहून माघारी फिरलो. पुढे तटबंधी वरून पूर्ण किल्ल्याला फेरा मारून परतीचा प्रवास चालू केला. 
    चोर दरवाजा - किल्ले मल्हारगड
    चोर दरवाजा - किल्ले मल्हारगड

    विहीर - किल्ले मल्हारगड
    विहीर - किल्ले मल्हारगड

    बांधीव तलाव - किल्ले मल्हारगड
    बांधीव तलाव - किल्ले मल्हारगड

    राजवाडा अवशेष - किल्ले मल्हारगड
    राजवाडा अवशेष - किल्ले मल्हारगड

    खंडोबा व महादेव मंदिर - किल्ले मल्हारगड
    खंडोबा व महादेव मंदिर - किल्ले मल्हारगड
    बाले किल्याचा महादरवाजा - किल्ले मल्हारगड
    बाले किल्याचा महादरवाजा - किल्ले मल्हारगड
    मुख्य दरवाजाचा आलीत बाजू  - किल्ले मल्हारगड
    मुख्य दरवाजाचा आलीत बाजू  - किल्ले मल्हारगड

    मुख्य दरवाजा - किल्ले म्हलारगड
    मुख्य दरवाजा - किल्ले मल्हारगड

    मुख्य दरवाजाचा आलीत बाजू  - किल्ले मल्हारगड

    झेंडेवाडी कडील टेकडी वरून दिसणारा - किल्ले मल्हारगड



    माघारी येताना दिवे घाटामध्ये उभारलेली विठ्ठलाची मूर्ती पाहिली. आम्हा भटक्यांसाठी प्रवासामध्ये सूर्योदय व सूर्यास्त म्हणजे एक सुंदर क्षण. त्यावेळचा तो सूर्यास्त दिवे घाटामधून पाहिला व पुढे कात्रज, वारजे व चांदणी चौकचा ट्राफिक मधून गाडी चालवण्याचे दिव्य पार करत एक दिवसाचा भटकंतीचा प्रवास रात्री ९:०० वाजता संपला.
    © सुशील राजगोळकर

    दिवे घाटातील विठ्ठलाची मूर्ती - सासवड
    दिवे घाटातील विठ्ठलाची मूर्ती - सासवड



    दौंड येथील विठ्ठल मंदिर

     आम्ही मित्र भिगवणला पक्षी निरीक्षणासाठी आलो असताना  प्रवासासाठी श्री. वैद्य यांची गाडी केली. दुसऱ्या दिवशी दुपारनंतर भुलेश्वर मंदिर बघायचे ठरले. मंदिर बघून झाल्यावर आमची आवड व उत्साह पाहून वैद्य यांनी दौंड येथील विठ्ठल मंदिर नक्की बघा असा आग्रह केला.  रात्री आठ वाजता घाईघाईत मंदिर पाहिले. दौंड शहरात मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे. सुरूवातीला नवीन सभामंडप बांधला आहे . आतील काम संपूर्ण दगडी आहे. साधारण हे मंदिर ३०० वर्ष जुनं असावं. परंतु आतली दोन्ही सभामंडप खूपच भव्य आहेत. आतील दगड अत्यंत अशलर मेसनरी बांधकामासारखे घडवलेले आहेत. आणि मध्यभागी महिरप आणि कमळाच्या फुलांच्या डिझाईनचा सुरेख मेळ घातलेला आहे. मंदिर प्रत्यक्ष पाहिल्यावर याची भव्यता कळते.
    दौंडला रेल्वेने आल्यास श्री मनोज वैद्य भिगवण,कुंभारगाव,  कुरकुंभची फिरंगाईदेवी, दौंड चे विठ्ठल मंदिर, भुलेश्वर मंदिर , लोणी भापकरचे वराह मंदिर दाखवून आणू शकतात. त्यांचा मोबाईल क्रमांक- +91 94223 37598
























    https://www.facebook.com/HistoryOfMarathaSardarFamily/photos/a.402197406577821/2241272336003643/?type=3



    जेजुरी परिसर


    जेजुरी परिसरातील विविध मंदिरे, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे यांचे माहिती सह सचित्र दर्शन

    साकुर्डे  पांडेश्वर  भुलेश्वर  नाझरे  वाल्हे  मोरगाव  सासवड  पुरंदर  वज्रगड  सोनोरी  शिवरी   नारायणपूर  केतकावळे  वीर  कानिफनाथ  हरेश्वर  चतुर्मुख  पिंगोरी  कोळविहिरे  हरणी  सोमेश्वर  गुळुंचे  टेकवडी  आंबळे  जवळार्जुन


    purandar_map


    *

    शंकरेश्वर / रामेश्वर / बोंबलेश्वर ( साकुर्डे )

     sakurde
    जेजुरीच्या पश्चिमेस ७ किमी अंतरावर असणाऱ्या साकुर्डे गावाचे दक्षिणेस असणाऱ्या डोंगर रांगा मधील दरीच्या परिसरास देवदरा या नावाने ओळखले जाते याच ठिकाणी ही मंदिरे आहेंत येथे गाडी रस्त्याने पोहचता येते. दरीच्या सुरवातीच्या टेकडीवर गणपती व बहिरव नाथाची छोटी मंदिरे आहेंत.पुढील दरीत शंकरेश्वराचे दक्षिणाभिमुख मंदिर आहे या मंदिराचे मंडपाचे अवशेष दिसतात मंडपात नंदी असून गर्भगृह खोल आहे गर्भगृहात शंकरेश्वराचे लिंग आहे. मणि मल्लदेत्याचे छळास कंटाळून आलेल्या ऋषींनी याच ठिकाणी आश्रय घेतला होता व शंकरांनी कडेपठारी मार्तंड अवतार धारण केलेवर ऋषींचे विनंती वरून ते येथे आले होते अशी जनश्रुती आहे. या मंदिराचे पूर्वेस एक जलकुंड आहे यास तापशमन तीर्थ म्हणतात. ऋषींनी जेथे शंकरांचे पाय धुतले त्या ठिकाणी ते निर्माण झाल्याचे सांगतात. येथेच शेजारी बोंबलेश्वराचे शिवलिंग आहे. या ठिकाणी गणपतीने शंखनाद केल्याने यास बोंबलेश्वर असे म्हणतात. या लिंगाचे दर्शनाने पृथ्वी प्रदक्षणेचे पुण्य मिळते असे मानले जाते. येथील दक्षिणे कडील दरीत रामेश्वराची छोटीशी घुमटी व एक शिवलिंगाकृती विहीर आहे. प्रभू रामचंद्र वनवासात असताना त्यांनी येथे वास्तव्य केले होते असे मानतात. आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे वास्तव्य या ठिकाणी होते.


    *

    पांडेश्वर

    pandeshwar
    जेजुरी पासून ८ किमी अंतरावरील पांडेश्वर या गावी कऱ्हा नदी काठी हे मंदिर आहे, जनश्रुती नुसार हे मंदिर पांडवानी बांधले म्हणून ते पांडवेश्वर काळाचे ओघात ते पांडेश्वर झाले . या मंदिराचे नावावरून हे गाव पांडेश्वर झाले कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह, अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरीने युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा व चुण्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गिलाव्याचे काम ईस ११९६ मध्ये झालेचे येथील मंदिरातील गिलाव्यावरील लेखातून समजते. गर्भगृहात एका भव्य आसनावर एक भव्य शिवलिंग आहे. वनवासात असताना पांडवानी हे लिंग स्थापून यज्ञ केल्याची जनश्रुती आहे. याच यज्ञासाठी गंगाजल आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवानी लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. मंदिरावरील कळसाचे व परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस एक गणपतीची घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपाद आहेंत या मुळे या क्षेत्रास गणेशगया ही म्हटले जाते, येथेच पांडवानी पितृश्राद्ध केल्याचे ही सांगतात मुख मंदिरा मागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेच पार्वतीची ही प्रतिमा आहे. मंदिराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच


    *

    भुलेश्वर

    bhuleshwar
    जेजुरी पासून १८ किमी अंतरावरील माळशिरस गावा पासून जवळच असणारे हे मंदिर सह्याद्रीच्या डोंगररांगा मधील भेलन डोंगर म्हणून ओळखल्या जात असलेल्या डोंगरावर आहे. इतिहासा मध्ये ” किल्ले दौलत मंगल ” अशी याची ओळख आहे ईस १६३४ मध्ये मुरार जोगदेव यांनी येथे किल्ल्याचे काम केल्याचे संदर्भ सापडतात येथे गाडी रस्त्याने थेट मंदिरापर्यंत जाता येते, एका भव्य चौथर्यावर भव्य भुलेश्वराचे मंदिर आहे,मंदिरापुढील मंडप व नगारखाना ईस १७४० मध्ये पेशव्यांनी बांधला आहे. मंदिराची तटबंदीची बाह्य बाजू अठराव्या शतकातील वाटते. मंडपातून जिन्याने वर चढून गेले की मुख्य मंदिराचा आवार लागतो येथील शिल्पकलेचे सौन्दर्य मंत्र मुग्ध करणारे आहे. जनश्रुती हे मंदिर पांडवानी एका रात्री मध्ये बांधल्याचे सांगते पण या मंदिराचे काम ईस १२५० चे दरम्यान चोलवंशीय राजांनी केल्याचे जाणकार सांगतात, नंदी मंडप, चौरस मंडप, अंतराळ, नक्षत्राकृती गर्भगृह अशी या पूर्वाभिमुख मंदिराची रचना आहे, नंदीमंडपाचे स्तंभ व वरील भाग कलाकुसरीने युक्त असून यक्ष, प्राणी, देवताचे मूर्ती येथे दिसतात चौरस मंडपास तीनही बाजूने प्रवेशद्वार असून यांचेवर सुबक नक्षीकाम केलेले आहे प्रवेशद्वाराचे बाजूस युद्धशिल्प , गजशिल्प आहेंत. मंडपाचे आतील बाजुस छतावर यक्षमूर्ती, कीर्तिमुख,समुद्र मंथन, कोरलेले आहे. पुढे अंतराळ लागतो गर्भगृहाचे प्रवेशद्वार कलाकुसरीने युक्त आहे गर्भगृहात शिवलिंग आहे शिवलिंगामध्ये खोलात स्वयंभू रूपातील लिंग आहेत, मंदिराचे सभोवतालीच्या मंडपात अनेक देवकोष्ट आहेंत मुख्य मंदिराचे बाह्यअंगावर अनेक सोष्टव पूर्ण शिल्प दिसतात ही आज खंडित अवस्थेत आहेत तरीही त्यातील सौन्दर्य अप्रतिम आहे नर्तिका, दर्पणधारिणी, देवता अशी अनेक शिल्प यात आहेत. मंदिरावरील नक्षीकाम अवर्णनीय आहे. बाह्यमंडपाचे वरील बाजुस मातृका शिल्पपट आहेंत यात एंद्री,वाराही,महेश्वरी.विनायकी, वेष्णवी, अश्या अनेक मातृका दिसतात.मंदिर परिसरात सातवाहनकालीन पाण्याची टाकी आहेत, येथील अनाम शिल्पकारांची कला पाहण्यासाठी एकदा तरी आवर्जून येथे भेट दिली पाहिजेच.


    *

    नागेश्वर ( नाझरे )

    nazare
    जेजुरी पासून ९ किमी अंतरावर असलेल्या नाझरे गावी कऱ्हा नदी काठी हे पूर्वाभिमुख मंदिर नदीच्या पुर्व तटावर आहे. अलीकडे या मंदिराचे जिर्नोधारातून त्याला आधुनिक रूप मिळाले आहे, या ठिकाणी नाग तप करत होता व त्याने स्थापन केलेले शिवलींगम्हणून ते नागेश्वर मंदिराचे मागील बाजूस कऱ्हा नदी मध्ये सुंदर धबधबा आहे. नदीवरील मल्हार सागर धरण भरून वाहू लागल्यावर हा धबधबा पडू लागतो या धबधब्यामुळे नदीत तयार झालेल्या डोहास नागतीर्थ असे म्हणतात


    *

    महर्षी वाल्मिकी समाधी ( वाल्हे )

    valha
    जेजुरी पासून १२ किमी अंतरावर वाल्हे या गावी हे समाधी मंदिर एका ओढ्या काठी आहे. पुरातनकाळी वाल्ह्या कोळी या ठिकाणी राहून वाटमारी करीत असे त्याचे नावा वरून या भागास वाल्हे असे नाव पडले. गावाचे उतरेस एका उंच डोंगरावर सात उंच खडक दिसतात हे वाल्ह्या कोळी याचे सात रांजण असल्याची जनश्रुती आहे. या वाल्ह्या कोळयास वाटमारी करताना नारदांचा अनुग्रह झाला व त्याचा वाल्मिकी झाला याच वाल्मिकीने पुढे रामायण हे महाकाव्य लिहिले व ते महर्षी वाल्मिकी ऋषी झाले अश्या या महर्षी वाल्मिकीचे हे समाधी स्थळ. येथे भाद्रपद शुद्ध पंचमीस म्हणजे ऋषी पंचमीला मोठी यात्रा भरते


    *

    मयूरेश्वर ( मोरगाव )

     morgoan
    जेजुरी पासून मोरगाव १७ किमी अंतरावर आहे. अष्टविनायकातील प्रथम गणपती म्हणजे मोरगावचा मयूरेश्वर होय. ब्रम्हा, विष्णू , महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवांनी या गणरायाची स्थापना केले असे मानले जाते. त्रेतायुगात पृथ्वीवर सिंदुरासूर राक्षसाने सर्व देवांना बंदिवासात टाकले होते. तेव्हा पार्वतीने मातीचा गणपती करून त्याची आराधना सुरु केली व भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीने जन्म घेतला त्या नंतर गणपतीने मोरावर स्वार होऊन सिंदुरासूर राक्षसाचा वध केला त्याचे मयूर वाहनामुळे त्याला मयूरेश्वर हे नाव मिळाले. येथील मयूरेश्वर मंदिराची उभारणी सोळाव्या शतकात झाली असल्याचे सांगितले जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे दहा दिवस मोरगाव येथे यात्रा असते, या दिवसात भाविकांना गर्भगृहात प्रवेश मिळतो.


    *

    सासवड

    सासवड जेजुरी पासुन १७ किमी अंतरावर असुन पुरंदर तालुकाचे मुख्यालय आहे, या शहराला सांस्कृतिक, ऐतिहासिक , धार्मिक वारसा लाभलेला आहे. संत नामदेवांनी सोपानदेव समाधी वर लिहिलेल्या अभंगात या गावाचा उल्लेख सवंत्सर असा केलेला आहे. जुन्याकाळी या ठिकाणी सहा वाड्या होत्या वरखेडवाडी, सरडी, सदतेहे, सवंत्सर, दाणे पिपळगाव, सनवडी या वाड्याचे स्वरूप एकत्र होऊन या पासुन सासवड हे गाव अस्तित्वात आले असे मानले जाते, ही नगरी कर्‍हा व चरणावती या दोन नद्यांचे संगमावर उत्तर बाजुस वसली आहे. या गावास शिवकाळात संपूर्ण कोट होता, मोगली आक्रमणांच्या काळात त्याची नासधूस झाली, छत्रपती शाहूमहाराज यांचे काळात या कोटाचा उपयोग दमाजी थोरात यांनी पुरंदर किल्ल्यास शह देण्यासाठी केला, या बंडाचा बीमोड झाल्यानंतर या कोटाचा उपयोग पुरंदर किल्ल्यास शह देण्यास पुन्हा होऊ नये या साठी हा कोट मुद्यामच जमीनदोस्त करुन नामशेष करुन टाकला गेला . पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचाही वाडा या ठिकाणी होता, काळाचे ओघात तो नष्ट झाला. सासवड मध्ये श्री संगमेश्वर , वटेश्वर , सिध्देश्वर, कर्‍हामाई ही मंदिरे सरदार पुरंदरे, कुंजीर यांचे वाडे संत सोपानदेव महाराज, पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ , सरसेनापती वीर बाजी पासलकर, गोदाजीराजे जगताप यांची समाधी स्थाने आहेत हे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांचे जन्मगांव महात्मा गांधीचे शिष्य शंकरराव देव, प्रेमलता कंटक यांनी स्थापना केलेला कस्तुरबा आश्रम अशी अनेक प्रेक्षणीय, ऐतिहासिक,धार्मिक ठिकाणे येथे आहेत.

    संत सोपान देव संजीवन समाधी मंदिर

    sopandev temple saswad (Copy) (Copy)
    येथील चरणावती नदी काठी हे मंदिर आहे, मंदिरास पुर्वाभिमुख भव्य कोट असुन पायऱ्या चढून कोटात प्रवेश करता येतो, समोरच पूर्वाभिमुख पुरातन शिव मंदिर असुन

     sopandev samadhi temple saswad

    या मंदिराचे मागील बाजुस संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर आहे, पूर्वाभिमुख मंदिराची रचना वीणामंडप, मंडप व गर्भ गृह अशी आहे,

    sopandev temple mandap saswad

    वीणामंडप लाकडी असुन या वर पत्र्याचे छत आहे, मंडपाचे लाकडी खांब नक्षीने युक्त आहेत, या मंडपात हनुमानाची प्रतिमा आहे, येथे अखंड वीणा वादन केले जाते, या मंडपातून मंदिराची मुख्य दगडी मंडपात जाता येते.

    sopandev mandap saswad

    या मंडपात गर्भगृहाचे दरवाज्याचे दोन्ही बाजुस देवड्या असुन दक्षिणे कडील देवडीत राम लक्ष्मन सीता यांचे मुर्ती असुन उत्तरे कडील देवडीत विठ्ठल रुक्मिणी यांच्या मुर्ती आहेत,

    sopandev sanjivan samadhi - saswad

    मंदिराचे गर्भ गृहात संत सोपानदेवांची संजीवन समाधी असुन समाधी मागील कोनाड्यात कृष्ण मुर्ती आहे.

    sant sopandev
    संत सोपानदेव हे संत ज्ञानेश्वरांचे बंधू यांचा जन्म कार्तिक शुद्ध पौर्णिमा शके ११९९ (ईस १२७७) मध्ये झाला भगवदगीतेवर त्यांनी साररूप ओवीबद्ध टीका ” सोपानदेवी ” या नावाने लिहिली. वयाचे १९ वे वर्षी त्यांनी मार्गशीर्ष वद्य तृतीया शके १२१८ ( ईस १२९६) साली त्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली,

    datta mandir saswad
    समाधी मंदिराचे मागील बाजुस दत्त मंदिर आहे.

     sopandev samadhi marg - saswad
    समाधी मंदिराचे उत्तर बाजुस एका चिंचेच्या वृक्षा खाली एक दगडी चोथारा असुन या ठिकाणा हून संत सोपान देवांनी आपल्या समाधीत समाधिस्त होण्यासाठी प्रवेश केला

    sopandev charnavati saswad
    या मंदिरात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी ते अमावस्या या कालावधीत येथे यात्रा भरते,

    sopandev prasthan
    आषाढी वारी साठी संत सोपानदेवांचा पालखी सोहळा येथून प्रस्थान करतो

    संगमेश्वर मंदिर

    sangmeshwar saswad
    कऱ्हा व चरणावती या दोन नद्यांचे संगमावर संगमाचे पश्चिम तटावर बांधलेले हे पूर्वाभिमुख शिवमंदिर नदी संगमावर असलेला हा संगमेश्वर, नदी संगमावर बांधलेल्या भव्य दगडी घटावर हे देखणे मंदिर आहे मंदिराचे उत्तर पुर्व बाजुस असलेल्या लोखंडी पुला वरून मंदिराचे घाटावर जाता येते. हे पेशवेकालीन मंदिर त्याकाळच्या मंदिर निर्माण कलेचे एक आदर्श उदहरण आहे, घाटावरील विशाल दगडी पायरी मार्गाने या मंदिराचे आवारात पोहचता येते मुखमंडप, मंडप, गर्भगृह अशी पुर्वभिमुख दगडी मंदिराची रचना असुन मुखमंडप ३० दगडी खांबांवर आधारलेला आहे, याच मंडपात एक सुंदर दगडी नंदी प्रतिमा आहे.

    sagameshwar gate saswad
    मंदिराचा मंडप सुबक दगडी बांधणीचा आहे, मंडपात डाव्या बाजुस गणपती व दक्षिण बाजूस मारुतीची मूर्ती आहे मंडपास उत्तर व दक्षिण बाजुने प्रवेशद्वार आहेत, मंडपाचे मध्यभागी कासव कोरलेले आहे. येथील खांबावर जय विजय यांचे प्रतिमा आहेत. मंडपातील गर्भगृहाचा दरवाजा कलाकुसरीने नटलेला आहे.

     sanameshwar linga saswad
    गर्भगृहाचे प्रवेशदारातून गर्भ गृहात गेल्यावर समोरच संगमेश्वरचे शिवलिंगा चे दर्शन होते.

    sagmeshwar temple saswad
    मंदिराचे बाह्य अंग दगडावरील नक्षीकामाने नटलेले आहे. मंदिराचे दक्षिण बाजुच्या घाटावर खडकेश्वर मंदीर व आणखी काही छोटी मंदिरे आहेत. मंदिराचे मागील दक्षिण व उत्तर बाजुस दोन शिव मंदिरे आहेत. दक्षिण बाजुस वृंदावन व काही बांधकाम आहे.
    या मंदिरा समोरील पुलावरून या मंदिराचे विलोभनीय दर्शन होते. त्रिपुरी पौर्णिमा व दीपावलीत येथे रात्री दिपोस्तव साजरा होतो.

    कर्‍हामाई मंदिर
    संगमेश्वर मंदिराचे पुर्व बाजुस कऱ्हा नदीचे उत्तर बाजुस हे मंदिर आहे पुरंदरची जीवन रेखा असलेल्या कर्‍हा नदीचे हे प्रतीकात्मक मंदिर मंदिराचे आवाराचे बांधकाम एका वाड्या प्रमाणे देऊळ वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तरेस असुन , या दरवाज्यातून आत गेल्यावर प्रशस्त आवार लागते यात पश्चिम बाजुस लाकडी मंडप असुन मंडपात पश्चिम बाजुस एका चोथर्यावर रका देवडीत कर्‍हामाईची मुर्ती आहे, वनवासात असताना पांडवानी पांडेश्वर येथे शिवलिंग स्थापून यज्ञ केल्याची जनश्रुती आहे. याच यज्ञासाठी गंगाजल आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवानी लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची व चरणावती नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. चरणावती नदी येथील संगमावर कऱ्हा नदीस मिळते व येथून पुढे वाहते

    पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ समाधी

     balaji vishvanath peshwa saswad
    कर्‍हामाई मंदिराचे दक्षिण बाजुस कर्‍हा तीरावर ही समाधी असुन समाधी परिसरात छोटासा बगीचा आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे मुळचे कोकणातील त्यांचा जन्म अंदाजे ईस १६६० मधील , १६८९ पासुन ते स्वराजाचे सेवेत होते, छत्रपती राजाराम जिंजीवरून परत आल्यावर बाळाजी पुण्याचे सर सुभेदार झाले, त्यावेळे पासुन त्यांचे वास्तव्य सासवडला होते, सासवड येथे त्यांनी वाडा बांधला होता राजारामाचे मृत्यु नंतर राणी ताराबाई व धनाजी जाधव यांचे नेतृत्वा खाली ते कार्यरत होते. औरंगजेबाचे मृत्यू नंतर शाहू महाराज मोघलांचे कैदेतून मुक्त झाले. धनाजी जाधव शाहुना मिळाले त्यांचे बरोबर बाळाजी शाहुना मिळाले. बाळाजीनी अनेक मराठा सरदाराना शाहून कडे वळवून त्यांची शक्ती वाढवली. व ते शाहूंचे विश्वासू झाले. कर्तबगार बाळाजी वर विश्वास टाकून शाहूराजांनी त्यांना १७ नोव्हे १७१३ रोजी ” पेशवे” ( पंतप्रधान ) पद दिले. बंडखोरी मोडून शाहूंचा अंमल प्रस्थापित करणे, कान्होजी आंग्रे ना शाहू गोटात आणणे, शाहूंच्या परिवाराची मोगलान कडून सुटका, स्वराजाच्या सनदा आणणे अशी अनेक कामे त्यांनी केली मराठा सरदारांची एकी करून त्यांनी सत्ता विस्ताराचा पाया रोवला. २ एप्रिल १७२० मध्ये सासवड येथे त्यांचे निधन झाले.

    गोदाजीराजे जगताप समाधी

     godaji jagtap saswad
    संगमेश्वर मंदिराचे उत्तर बाजुस असणाऱ्या रस्त्याचे पश्चिम बाजुस पूर्वभिमुख छोटीशी घुमटी आहे , ही गोदाजीराजे जगताप यांची समाधी, गोदाजी जगताप हे छत्रपती शिवाजीचे बालमित्र स्वराज उभारणीत त्यांनी शिवरायांना मोलाची साथ दिली, तोरण्याचा विजय व स्वराज्याचे पुरंदर किल्ल्या वरून लढलेले स्वराजाचे पहिले समर यात त्यांचे योगदान होते गोदाजीचा संपूर्ण इतिहास आजही प्रकाशात आलेला नाही. ईस १६४९ मध्ये स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर वरून लढली गेली, विजापूरचे सैन्य शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पुरंदर कडे निघाले , या सैन्याने खळद बेलसर जवळ छावणी टाकली होती फतेखानाने पुरंदर साठी नेट लावला होता, बाळाजी हैबत याने शिरवळचा कोट जिंकून पुरंदरला शह दिला होता. शिवाजी महाराजांनी कावजी मल्हार यास शिरवळ चे कामगिरीवर पाठवले यात गोद्जी सोबत होते व ही मोहीम फत्ते झाली. पुरंदर वरील सैन्याने बेलसर मधील छावणीवर अचानक छापा मारला. त्यामुळे मुसेखानाचे सैन्य पुरंदरवर चालून आले. येथील लढाईत मुसेखान व गोदाजी जगताप यांची गाठ पडली, तुबळ लढाईत गोदाजीने मुसेखानाला उभे चिरले हे पाहून विजापूर सैन्य पळून गेले. या गोदाजीचे पराक्रमाचा उल्लेख इतिहासात आढळतो गोदाजीचा मृत्यु केव्हा झाला हे आज तरी माहित नाही, या पराक्रमी वीराची ही समाधी

    वीर बाजी पासलकर समाधी

    baji pasalkar saswad
    सासवड शहरातील नेहरू चौकात ही समाधी आहे. बाजी हे मावळातील वजनदार योद्धे त्यांनी मावळातून स्वराज स्थापणे साठी मोठी रसद उभी केली, ईस १६४९ मध्ये फतेखानाचे छावणीवर खळद बेलसर परिसरात अचानक हल्ला केला. या वेळी च्या लढाईत बाजींना वीरमरण आले स्वराजाच्या यज्ञकुंडात आत्मआहुती देणारे बाजी पासलकर हे जेष्ट नामाकीत होत.

    चांगा वटेश्वर मंदिर

    vateshwar saswad
    संगमेश्वर मंदिराचे दक्षिण दिशेस सासवड – नारायणपूर रस्त्याचे थोडेसे बाजुला कऱ्हा काठावर असणारे हे सुंदर दगडी मंदिर, जुन्याकाळी हे मंदिर नीलकंठ या नावाने ओळखले जात होते, या परिसरात मोठे पुरातन अनेक वटवृक्ष आहेत या कारणाने या मंदिरास वटेश्वर हे नाव पुढे मिळाले असावे , जुन्याकाळी हा परिसर सिद्धसाधकांची तपोभूमी होता १४०० वर्ष जगले अशी जनश्रुती असलेले सिद्धयोगी चांगदेव यांनी येथे वास केल्याचे मानले जाते, चांगदेव लहान असताना त्यांचे आई-वडील लहानपणी निवर्तल्याने त्यांचे बालपण वटेश्वराचे सानिध्यात गेले, त्यांनी येथे तपाचरण केली या मुळे हे मंदिर चांगा वटेश्वर मंदिर या नावाने ही प्रसिद्ध आहे.
    कऱ्हा नदी वरील छोटा पूल पार करून पायऱ्या चढून मंदिरचे कोटाचे प्रवेशद्वारात पोहचता येते, मंदिराचा कोट दगडी बांधकामाचा आहे ,

    vateshwar temple saswad
    मंदिराचे प्राकारात वटेश्वराचे पूर्वाभिमुख दगडी मंदिर आहे मंदिराची रचना मुखमंडप, मंडप, गर्भगृह, अशी आहे मुख मंडपात प्रवेश करण्यासाठी पूर्वा, उत्तर, दक्षिण बाजुंनी पायऱ्या आहेत, मंडपाचे दगडी खांबानवर विविध पुष्प, प्राणी, नर्तिका, युगल यांची शिल्प कोरलेली आहेत. या मंडपा मध्ये सुंदर कलाकुसरीने नटलेली मोठी नंदी प्रतिमा आहे या मंडपातील पश्चिम द्वारातून मंदिराचे मंडपात जाता येते

    vateshwar mandap saswad
    मंदिराचा मंडप सहा खांबावर आधारलेला असुन या खांबावर सुबक नक्षीकाम केलेले आहे या मंडपास ही उत्तर व दक्षिण बाजुने प्रवेशद्वार आहेत. या मंडपाचे पुढे पश्चिमेस अंतराळ असुन पुढे गर्भगृह लागते, गर्भागृहाचे दरवाजा कोरीव कामाने नटलेला आहे

    vateshwar linga saswad
    गर्भ गृहाचे दरवाज्यातून आत गेल्यावर समोर वटेश्वराचे शिवलिंग आहे , शिवलिंग मागे पश्चिम बाजुस एका कोनाड्यात संगमरवरी गणपतीची मुर्ती आहे.
    मंदिराचे सभोवताली ओवऱ्या असुन कऱ्हा तीरावर घाट बांधलेला आहे, पेशवे काळात सखाराम बापू बोकील यांनी हा घाट बांधला व मंदिराचा जिर्णोधार केल्याचे सांगितले जाते ,

    सिद्धेश्वर मंदिर

    sidheshwar saswad
    सासवड पासुन २ किमी अंतरावर कऱ्हा नदीस पुरंदर किल्ला केदारेश्वर येथून वाहणारा केदारगंगा ओढा जिथे मिळतो, त्या संगमा जवळ हे पूर्वाभिमुख मंदिर नदीच्या पश्चिम काठावर आहे, सासवड पाणी पुरवठ्याचे पंपिंग स्टेशन जवळून असणाऱ्या लोखंडी पुलावरून कऱ्हा नदी ओलांडून या मंदिराकडे जाता येते, मंदिरा समोर कऱ्हा नदी काठी छोटासा घाट असुन मंदिरासमोर एका मेघडंबरी मध्ये नंदी प्रतिमा आहे येथील अवशेषा वरून जुन्याकाळी या मंदिरास कोट असावा असे वाटते,

     sedheshwar temple saswad
    पूर्वाभिमुख दगडी मंदिराची रचना मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे, नंदी पुढील पुर्वद्वारा शिवाय मंडपास उत्तर व दक्षिण बाजूनेही प्रवेशद्वार आहेत मंडपात पश्चिम बाजुस गर्भगृहाचे प्रवेशद्वाराचे शेजारील भिंतीत दोन देवड्या असुन दक्षिण बाजूचे देवडीत गणेश प्रतिमा आहे तर उत्तर बाजूचे देवडीत विष्णू प्रतिमा आहे, मंडपाचे पुढे छोटेसे अंतराळ असे त्यापुढे नक्षीकामाने नटलेले गर्भगृहाचे प्रवेश द्वार आहे

     sidheshwar linga saswad
    गर्भगृहाचे प्रवेश द्वारातून पायरी उतरून गर्भगृहात जावे लागते, गर्भगृहात मध्यभागी सिद्धेश्वराचे शिवलिंग असुन लिंगा मागील पश्चिम बाजुस कोनाड्यात पार्वतीची मुर्ती आहे
    या मंदिराचे बांधकामावरून हे पेशवे कालीन असावे असे वाटते, नितांत सुंदर रमणीय शांत परिसर असलेले हे मंदिर आवर्जून पाहावे असेच.

    पुरंदरे वाडा

    purandare wada saswad
    पहिले पेशवा बाळाजी विश्वनाथ याचे दिवाण अबजीपंत पुरंदरे यांनी हा वाडा ईस १७१० मध्ये बांधला, याच वाड्याचे बाधकाम करणाऱ्या कलाकारांनी पुढे ईस १७३० मध्ये पुण्याचे शनिवार वाड्याचे बांधकाम केले. या वाड्याची तटबंदी सुमारे ८० फूट उंचीची असुन प्रवेशद्वार सुमारे २० फूट उंचीचे आहे, वाड्यामधील लाकडी बांधकाम अजून उभे आहे, सासवड मधील बाळाजी विश्वनाथ पेशवे, अनेकांचे वाडे नष्ट झाले असुन पुरंदरे वाडा आपल्या गतस्मृती सांभाळत आजही उभा आहे.


    *

    पुरंदर किल्ला

    purandar
    जेजुरी पासून ३३ किमी अंतरावर असणारा पुरंदर किल्ला स्वराज्याचे प्रमुख शिलेदारा पेंकी एक, हा किल्ला समुद्र सपाटी पासुन १३८५ मीटर उंचीवर असून. ईस अकराव्या शतका पासून हा किल्ला अस्तित्वात असल्याचे संदर्भ मिळतात, यादव, निजाम, बहामनी,यांच्या राजवटी या किल्ल्याने पहिल्या. पहिल्या आदिलशहा कडे असणारा हा किल्ला येथील किल्लेदाराचे मृत्यु ने निर्माण झालेल्या वारसांचे वादात मध्यस्ती करून त्यांना आपल्या सेवेत सामावत शिवरायांनी या किल्ला स्वराज्यात आणला. स्वराज्याचे सुरवातीचे मनसुभे याच गडावर घडले. दिलेरखानाने पुरंदरला दिलेल्या वेढ्यात त्याचे अमिष नाकारून स्वराज्यासाठी आपली आहुती देणाऱ्या मुरारबाजी च्या रणयज्ञाचा हा साक्षीदार शौर्याची स्पुर्ती जागवित उभा आहे,

    sardarwaja - purandar

    गाडी मार्ग थेट किल्ल्याचे प्रवेशद्वारा पर्यंत पोहोचलेला आहे . नारायण पेठ या पायथ्याच्या गावातून पायवाटेने ही सर दरवाज्या मधून किल्यावर पोहचता येते. पुरंदरच्या पुरंदर माचीवर हे दोन्ही रस्ते पोहचतात. किल्याचे सर दरवाज्या कडील तटबंदी काहीशी सुस्थितीत असुन दक्षिण बाजुच्या महाकाळ माची व बावची माची यांची तटबंदी काळाचे ओघात नष्ट झाली आहे.

    padmavati talav - purandar

    पुरंदर माचीवर पश्चिमेस पद्मावती तलाव व पूर्वेस राजळे तलाव आहेत

    murarbaji - purandar

    याच माचीवर मुरारबाजी देशपांडे यांचा पुतळा उभारण्यात आला असुन

    shivaji - purandar

    बहिरव खिंडी जवळ शिवरायाचा पुतळा आहे याच भगत पूर्वी बहिरव दरवाजा होता.

     purandareshwar - purandar

    माचीवर पुरंदरेश्वराचे मंदिर आहे हा किल्ल्याचा अधिपती देव या मंदिरास छोटासा कोट असुन मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे मंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात पुरंदरेश्वर शिवलिंग व मागील बाजुस पार्वतीची मुर्ती आहे. या मंदिरा शेजारी बांधीव सुंदर आड आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला होता.

    shiv mandir - purandar

    या मंदिराचे पश्चिमेस रामेश्वराचे पेशवे कालीन मंदिर आहे. किल्ल्यास जुन्याकाळी पाच दरवाजे असल्याचे सांगतात पण आज फक्त सर दरवाज्याच अस्तित्वात आहे.

     binni darwaja purandar
    पुरंदरेश्वर मंदिराचे शेजारील चढणीच्या पायवाटेने व काही पायऱ्या चढून बालेकिल्याचे बिन्नी दरवाज्यात पोहचता येते. या दरवाज्याचे बाहेरील बाजुस हनुमान व लक्ष्मिआई याची स्थापना केलेली आहे. या दरवाज्या पुढे दोन दरवाजे लागतात . बिन्नी दरवाज्यातून कंदकड्यावर पोहोचतो या कड्यावर पाण्याचे टाके असुन जवळच विरुद्ध बाजुस तटाला चोर दरवाजा आहे.
    बिन्नी दरवाज्यापुढे काही पायऱ्या चढल्यावर गणेश दरवाजा आहे. याचे डावे बाजुस कोनाड्यात गणेश मुर्ती आहे

    purandar dili darwaja याचे पुढे एक उत्तराभिमुख दरवाजा लागतो यास निशाण दरवाज्या म्हणतात याचे शेजारी निशाण बुरुज असुन त्यावर निशाण लावण्याचे जागा आहे.

     burunj - purandar
    येथील तटबंदी ला शेंद्र्या बुरुज असुन ईस १३८० दरम्यान या बुरुजाचे काम करताना सारखे ढासळत होते .तेव्हा बिदरचा बादशहा महमूद याचे आदेशाने नाथनाक व देवकाई या नवविवाहित दाम्पत्यास जिवंत गाडून हा बुरुज उभारण्यात आला. आजही हा बुरुंज ही करून कहाणी सांगत उभा आहे.

    hatti burunj purandar

    याच्यापुढे साखरी तलाव असुन पुढे हत्ती च्या मस्तका प्रमाणे प्रमाणे बांधलेला तिहेरी हत्ती बुरुज आहे त्याचे नैरुत्य दिशेस कोकण्या बुरुज आहे.
    केदार टेकडीचे दक्षिण बाजुस केदार दरवाज्या आहे केदार दरवाज्या व बिन्नी दरवाज्या याचे मध्ये सरळ असलेली तटबंदी आता नष्ट झाली आहे . केदार दरवाजा हा संकट काळी रसद पुरविणारा व बचावासाठी उपयोगी दरवाजा

    Rajgadi - purandar
    निशाण दरवाजा ओलांडून आत गेले की समोर दिसणाऱ्या टेकडीस राजगादी म्हणतात या टेकडी वर काही पाण्याची टाकी, व अनेक जुन्या इमारतींचे भग्न अवशेष असुन या ठिकाणी पूर्वी अनेक महत्वाचे वाडे होते . केदार टेकडी कडील उत्तरावर दारूगोळ्याचे कोठाराचे भग्न अवशेष आहेत.

    kedareshwar - purandar
    राजगादीचे पश्चिमेस केदार टेकडीची चढण काही अंतरावर सुरु होते.मंदिराचे टेकडीवर जाण्यासाठी सुमारे ७० बांधीव पायरीचा मार्ग आहे. केदार टेकडी किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. येथील अतिशय छोट्या पठारावर केदारेश्वराचे पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंदिरा समोर नंदी मेघडंबरी आहे तिचे पुढील बाजुस चोथरे व एक दीपमाळ आहे. गर्भगृहात केदारेश्वराचे शिवलिंग असुन मागील बाजुस इंद्र मुर्ती आहे. या किल्ल्याचे पुरंदर हे नाव इंद्राचेच एक नाव आहे. या मंदिरापासून केदारगंगा उगम पावते व सासवड जवळील सिद्धेश्वर मंदिराजवळ कर्हा नदीस मिळते.

    पुरंदर किल्ल्याचा इतिहास
    पुरंदर म्हणजे इंद्र होय. या पर्वतावर गौतम ऋषीच्या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी इंद्राने येथे तप केले होते. म्हणून या किल्ल्याचे पर्वत रांगेस इंद्रनील असे नाव लाभले होते. या मुळेच या पर्वतास पुरंदर नाव प्राप्त झाले.
    या किल्ल्याचे इतिहासातील नोंदी यादव पुर्वा काळापासून आढळतात. या किल्यावर यादवांचे राज्य होते.
    ईस १३५० मध्ये बहामनी सत्तेच्या ताब्यात हा किल्ला गेला.
    ईस १३८० बहामनी राज्या कडून किल्ला दुरुस्ती शेद्र्या बुरुंज उभारणीत नाकनाथ व देवकी या नवविवाहित जोडप्याचा बांधकामात गाडून बळी
    ईस १४८६ अहमदनगर निजामशाही चे किल्ल्यावर राज्य
    ईस १५९६ निजामशाहीने मालोजीराजाना जहागिरीत किल्ला दिला.
    ईस १६२९ किल्ला आदिलशाही कडे

    shivaji maharaj - purandar
    ईस १६४७ पुरंदरचा किल्लेदार महादजी निळकंठ यांचा मृत्यू, त्याचे मुलां मधील वादात मध्यस्ती करून शिवाजी महाराजांनी किल्ला स्वराजात आणला. स्वराज स्थापनेच्या सुरवातीच्या कालखंडात महाराजांचे वास्तव्य याच गडावर, स्वराज्याचे सुरवातीचे हालचाली येथूनच,
    ईस १६४८ पहिली लढाई याच किल्या वरून कूच करून लढली व बेलसर येथे विजय मिळवला,

    sambhaji-mahara
    १४ मे १६५७ राणी सईबाई याच्या पोटी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म
    ५ सप्टे १६ राणी सईबाई यांचे निधन, कापूरहोळ च्या धाराऊ गाडे यांनी दुधमाता बनून संभाजीना वाढविले.
    ईस १६६० पुरंदर वरून कूच करून पुण्यातील लालमहालात शाहिश्ते खानाची बोटे तोडली.
    ३० मार्च १६६५ पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाचा वेढा
    १४ एप्रिल १६६५ दिलेरखान बरोबरील युद्धात वज्रगड पडला, पुरंदरावर मोघलांचा हल्ला.

    murarbaji
    एप्रिल, मे १६६५ पुरंदर किल्ला मराठ्यांनी नेटाने लढविला, वेढा तोडण्यासाठी मुरारबाजी देशपांडे चे प्रयत्न, वेढा तोडण्यासाठी पराक्रमाची शर्थ दिलेरखाना बरोबरील युद्धात मुरारबाजींना वीर मरण. ( मुरारबाजी जन्म -१६१६, महाड ) मराठ्यांनी पुरंदरचा लढा सुरूच ठेवला.
    १३ जुन १६६५ पुरंदरच्या पायथ्याशी जयसिह व शिवराय चर्चा होऊन पुरंदरचा तह किल्ला मोघलांचे ताब्यात
    ८ मार्च १६७० निळोपंत मुजुमदारांनी किल्ला स्वराजात आणला.
    ईस १६८९ किल्ला मोघला कडे औरंगजेबाने किल्लाचे नाव आझमगड ठेवले
    ईस १६९१ किल्ला स्वराज्यात परत
    ईस १७०५ किल्ला मोघला कडे
    ईस १७०५ भोरचे पंत सचिवानी किल्ला मोघलांकडून परत मिळवला
    ईस १७०७ किल्ल्यावर छत्रपती शाहूचे वास्तव्य
    ईस १७१३ छत्रपती शाहू महाराजांनी साताऱ्यात बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पदाची वस्त्र दिली, पेशवे परिवाराचा किल्ल्यावर निवास.
    ईस १७२७ चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर मराठ्यांची टांकसाळ सुरु केली.
    ईस १७६४ गडकरी अत्र्यान विरुद्ध जुन्या गडकर्याचे बंड मजूर म्हणून किल्ल्यात प्रवेश, गवतात लपविलेल्या तलवारीनी हल्ला गडावर कब्जा.
    ईस १७७४ नारायणराव पेशव्यांच्या गरोदर पत्नी गडावर निवासास, १८ एप्रिल १७७४ सवाई माधवरावांचा जन्म, वयाचे ४० व्या दिवशी पेशवे पदाची वस्त्र, पेशवाईचा कारभार गडावरून.
    ईस १८१८ गड इंग्रजांचे ताब्यात
    ईस १९६१ गडावर लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने सुरु केली, तत्कालीन संरक्षण मंत्री व्ही के कृष्णमेनन यांचे हस्ते उद्घाटन.
    १९ एप्रिल १९७० मुरारबाजी पुतळ्याचे अनावरण
    ईस १९७९ किल्ल्यावरील लष्करी प्रशिक्षणाची अकादमी भारत सरकारने हलवली


    *

    वज्रगड

    वज्रगड अथवा रुद्रमाळ हा पुरंदरचा जुळा किल्ला हा समुद्र सपाटी पासून १३४८ मीटर उंचीवर आहे पुरंदर व वज्रगड यांचे मध्ये भैरव खिंड आहे. पुरंदरच्या माचीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील रस्त्याने वज्रगडावर पोहचता येते, पायथ्याचे भिवडी गावा जवळील रडतोंडीच्या घाटाने पाउल वाटेने येथे पोहचता येते.

    vajragad

    दोन्ही रस्त्याने चढून आल्यावर खडकात खोदलेल्या व बाजुला तट असलेल्या पायरी मार्गाने

    uttar darwaja - vajragad

    वज्रगडाचे महाद्वारात पोहचता येते. महाद्वारा पुढे अजून एक दरवाजा लागतो.

    vajragad fort

    या दरवाज्यातून आत गेल्यावर खडकाचे प्रचंड सुळके दिसतात या उंच कातळांचा उपयोग प्रस्तरारोहण प्रशिक्षणा साठी केला जातो. हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे. किल्ल्याचे घेर्यास तटबंदी असुन टिळा ५ बुरुज आहेत.

    purvadarwaja - vajragad

    तटबंदी मधील एका भग्न छोट्या दरवाजा तून उतरून किल्ल्याचे माचीवर जाता येते.

     Vajragad-fort

    या माचीवर एक तीन भागात खोदलेले तळे असुन

    hanuman - vajragad

    याचे काठावर मारुती मंदिर असुन

     rudreshwar - vajragad

    रुद्रेश्वर शिव मंदिर आहे या रुद्रेश्वरा वरून या किल्ल्या रुद्रमाळ हे नाव मिळाले. हा या किल्ल्याचा अधिपती देव, पुरंदर हे इंद्राचे नाव आहे व इंद्राचे शस्त्र वज्र म्हणून पुरंदर शेजारी असलेला किल्ला म्हणून त्याला वज्रगड हे नावही प्राप्त झाले आहे. या मंदिरांचे पुढे काही अंतरावर पडलेले अवशेष आहेत या ठिकाणी काही काळ आद्यक्रांतिवीर उमाजी नाइक यांचे वास्तव्य होते. किल्ल्याचे वायव्ये कडील बुरजास जोडणारी एक डोंगराची उतरणारी डोंगराची सोंड आहे.या सोंडेच्या वरील तिसर्या टप्प्यावर उत्तानदेवाचे स्थान आहे. सोंडेच्या पायथ्याला कपिलेश्वर शिवस्थान आहे या वरून या सोंडेस कपिलधार असे म्हणतात.

    vjragad battle
    वज्रगडाचे बांधकामा विषयी निश्चीत माहिती उपलब्ध नाही. पण शिवपूर्व काळापासून त्याचे उल्लेख आढळतात ईस १६६५ मध्ये दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला व पुरंदर मिळविण्यासाठी त्याने प्रथम वज्रगड घेण्याचा प्रयत्न सुरु केला. वज्रगडाचे कपिलधारे वरून सेन्यासह तीन तोफा चढविण्यास सुरवात केली, गडा वरील मावळ्यांचा तीव्र प्रतिकार झेलत या तोफा वर आणल्या गेल्या. वज्रगडाचे किल्लेदार यशवंत बुवाजी प्रभु, व बाबाजी बुवाजी प्रभु. यांनी गड राखण्यासाठी निकराची झुंज दिली ३० मार्च १६६५ ते १४ एप्रिल १६६५ त्यांनी किल्ला ३०० मावळ्यांचे साह्याने लढविला. तोफांचे मार्याने किल्ल्याचा वायव्य बुरुंज ढासळला, व वज्रगड मोघ्लांचे ताब्यात गेला.

    पुरंदर व वज्रगडा वरील पुष्प वैभव

    flora purandar
    राम रावण यांच्या लंके मधील युद्धात मुर्चित पडलेल्या लक्ष्मणाला सावध करण्यासाठी लागणारी संजीवनी वनस्पती साठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेला या पर्वतातील भाग म्हणजे हा इंद्रनील पर्वत, इंद्रनील म्हणजेच पुरंदर असे वर्णन संत नामदेवांनी केलेले आहे. पुरंदर – वज्रगड येथील ओषधी वनस्पती व पुष्प वैभवासाठी प्रसिद्ध आहे.
    पुरंदरचे भोगोलिक स्थान त्याची उंची, माती ,पावसाचे प्रमाण यामुळे हवामानाची वेगळी देण या पर्वतास लाभली आहे , पुरंदर वज्रगडाचे डोंगर माथे पावसाळ्या मध्ये गवताने झाकलेले असतात, या डोंगर माथ्यावर मोठो झाडे झुडपे वाढू शकत नाहीत त्यामुळे जास्त पावसात मोठ्या उंचीवर वाढणाऱ्या खुरट्या वनस्पतींची जैवविविधता येथे आढळते. सह्याद्री मधील कळसुबाई, हिमालयातील काही भाग व अफगाणीस्तान, दक्षिणेतील अण्णामलाई येथील भागात आढळणाऱ्या काही वनस्पती येथे आढळतात. तर काही दुर्मिळ वनस्पती याच किल्ल्यावर आढळतात

    purandar flora
    ईस १९४५ मध्ये इंग्रज प्रशिक्षक फादर संतापो यांनी आपल्या पुरंदर येथील वास्तव्यात येथील वनस्पती व फुलांचा अभ्यास केला त्यांनी आपल्या ‘फ्लोरा ऑफ पुरंदर’ या पुस्तकात येथील सुमारे ६०० वन्य वनस्पतींची नोंद केली आहे. पावसाला सुरु झाल्यावर येथील पुष्प वैभव आकारू लागते ऑगष्ट, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात हा परिसर आपल्या पुष्प वैभवाने नटू लागतो. प्रत्येक महिन्यात वेगळेच पुष्प वैभव जन्म घेते, अगदी मार्च महिन्यात सुद्धा येथील काही फुले फुलतात. या पुष्प वैभवाची ही छोटीशी झलक


    *

    मल्हारगड

    malhargad
    जेजुरी पासून २३ किमी असणारा हा किल्ला किल्ल्याचे पायथ्याशी असणारे सोनोरी गावा मुळे सोनोरीचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. पेशव्यांचे तोपखाना प्रमुख पानसेचे सोनोरी हे इनाम गाव या गावात त्यांचा भुईकोट किल्ला आहे. याच पानसे परिवारातील भिवराव व कृष्णाजी पानसे यांनी ईस १७५७ ते ६० चे दरम्यान हा किल्ला बांधला व आपले कुलदेवत असणारे खंडोबाचे नावावरून या गडास मल्हारगड असे नाव दिले. ऐतिहासात बांधला गेलेला हा शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. गडावर बांधकाम सुस्थितीत असून खंडोबा व महादेव यांची छोटी मंदिरे आहेत खंडोबा मंदिरात खंडोबाची अश्वरूढ दगडी मूर्ती आहे


    &nbs;
    *

    यमाई देवी ( शिवरी )

    yamai shivri
    जेजुरी पासुन ७ किमी असलेले शिवरी गावाचे फाट्या वर हे यमाई देवीचे मंदिर आहे, एका बंदिस्थ प्राकारात पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराची रचना सदर, मंडप, गर्भगृह अशी आहे.गर्भ गृहात देवीचा तांदळा व महिषासुर मर्दिनी यमाईची मूर्ती आहे, सातारा जिल्ह्यामधील औध येथील यमाई एका भक्ताचे भक्तीने येथे आल्याचे सांगितले जाते.


    *

    नारायणेश्वर (नारायणपूर)

    narayaneshwar narayanpur
    जेजुरी पासून ३० किमी वर पुरंदर किल्ल्याचे पायथ्याशी असणारे गाव पूर्वी पुरंदर किल्ल्याची बाजारपेठ होते, या ठिकाणी सुमारे अकराव्या शतकातील हे नारायणेश्वर महादेवाचे मंदिर आहे. दगडी कालाकुसरीने युक्त असणारे हे मंदिर एका उधवस्त दगडी प्राकारात असून मंदिरातील दगडी खांब कोरीव असून गर्भगृहाचा दरवाजा नक्षीकामाने युक्त आहे. गर्भगृहात शिवलिंगाचे योनी मध्ये खोलात लिंग आहेत. मंदिराचे जवळ इंद्रायणी कुडा आहे.

    datta narayanpur

    मंदिराचे जवळ अलीकडे बांधलेले एक मुखी दत्ताचे मंदिर असून येथे गुरुवारी व दत्तजयंती सोहळ्यास मोठी यात्रा भरते.


    *

    प्रती बालाजी मंदिर (केतकवळे)

    balaji ketkavle
    जेजुरी पासून ३५ किमी अंतरावरील केतकवळे गावी अलीकडे राव यांचे धर्मादाय संस्थेने हे मंदिर उभारले आहे तिरुपती बालाजी मंदिराची ही देखणी प्रतिकृती असून तिरुपती मंदिरा प्रमाणेच येथील धार्मिक दिनक्रम असतो , रात्रीच्या वेळी रोषनाईने उजळलेले मंदिर अतिशय सुंदर दिसते


    *

    श्रीनाथ म्हस्कोबा (वीर)

    shrinath vir
    जेजुरी पासून ४५ किमी अंतरावर असणारे वीर गावी हे मंदिर आहे. एका दगडी बांधकाम असणारे भव्य प्राकारात हे भव्य मंदिर आहे पूर्वाभिमुख मंदिराची सदर, मंडप , गर्भगृह अशी रचना असून गर्भगृहात श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या मूर्ती आहेत या वारुळा पासून तयार झालेची लोकश्रद्धा आहे. श्रीनाथ हे काशी अथवा सोनारी चे काळबहिरव असून ते कमळोजी नामक भक्तामुळे या ठिकाणी वास्त्यव्यास आल्याचे सांगितले जाते हा देव स्मशान भूमीत प्रगट झालेने यास म्हस्कोबा असेही म्हणतात. माघ पौर्णिमा ते वद्य दशमी पर्यंत येथे दहा दिवस यात्रा भरते. माघ पौर्णिमेस रात्री बारा वाजता पालख्यांची मिरवणूक निघते व पहाटे २.३० ला देवाचे लग्न लागते. वद्य पंचमी पासून भाकणूक ( भविष्य वाणी) सुरु होते,वद्य दशमीस दुपारनंतर गुलालाचा रंग करून भाविकावर शिपला जातो याला मारामारी म्हणतात. प्रसाद घेऊन या यात्रे चा समारोप होतो.


    *

    कानिफनाथ (बोपगाव)

    kanifnath
    जेजुरी पासून २५ किमी अंतरावरील बोपगाव पासून ५ किमी अंतरावर समुद्र सपाटीपासून ९६० मीटर उंचीवर असणारे टेकडीवर हे कानिफनाथ मंदिर आहे. गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते.पूर्वाभिमुख असणाऱ्या मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे. मंदिरातून गर्भगृहात जाण्यासाठी एक लहान कोनाडा असून या कोनाड्यातून झोपून सरपटत गर्भगृहात जावे लागते, गर्भगृहात कानिफनाथांची समाधी आहे. कानिफनाथ हे नवनाथा मधील एक नाथ यांचा जन्म हत्तीच्या कानातून जाहला म्हणून यांना कानिफनाथ असे म्हणतात अशी जनश्रुती आहे.


    *

    चतुर्मुख ( गराडे)

    chaturmukh
    जेजुरी पासून २९ किमी असलेल्या गराडे गावाचे दरेवाडी जवळ २ किमी अंतरावरील एका टेकडीच्या मध्यावर हे मंदिर आहे. या टेकडीची समुद्र सपाटी पासून उंची १०२० मीटर असून छोट्या पूर्वाभिमुख मंदिरास नव्याने मंडप बांधला आहे. गर्भगृहात शिवलिंग आहे.हे ठिकाण ब्रम्हदेवांची तपोभूमी होती या ठिकाणी ब्रम्हदेव तप करत असताना पांडेश्वर येथे यज्ञ करीत असलेल्या पांडवानी गंगाजला साठी त्यांचा कमंडलू लवंडला व त्या जल प्रवाहा मधून कर्हा व चर्नावती या नद्या उगम पावल्याचे मानले जाते. मंदिराची उत्तर बाजूने चर्नावती व दक्षिण बाजूने कर्हा नदी उगम पावते. कर्हेचा स्पष्ट रुपात वाहणारा प्रवाह दरेवाडी येथून दिसू लागतो येथे काठावर कर्हामाई चे छोटे मंदिर आहे, गराडे गावात नदीवर छोटा घाट असून तेथे शिव मंदिरे आहेत यातील एका मंदिरास ही चतुर्मुख मंदिर म्हटले जाते


    *

    हरेश्वर

    hareshwar
    जेजुरी पासून २० किमी अंतरावर असणारे हे ठिकाण सासवड वीर रोडवर सासवड पासून ५ किमी अंतरावर पिंपळे गावाजवळ समुद्र सपाटी पासून ९३० मी उंचीवर असलेल्या टेकडीवर आहे . रस्त्यापासून मोठी चढण चढून टेकडीवर जावे लागते. टेकडीवर पूर्वाभिमुख शिवमंदिर असून टेकडीच्या दुसरया टोकावर दत्तमंदिर आहे दत्तमंदिरात एका छोट्या कोनाड्यातून जावे लागते. या टेकडीवरून पुरंदर वज्रगडा पासून पुरंदर तालुक्याचा जवळ जवळ सर्वच परिसर दृष्टीस पडतो. भटकंती करणाऱ्या भटक्या साठी सुंदर ठिकाण


    *

    वाघजाई ( पिंगोरी )

    pingori
    जेजुरी पासून १५ किमी अंतरावर असणारे पिंगोरी गावा मध्ये एका बंधिस्त प्राकारात लाकडी मंडप व गर्भगृह अशी रचना असणारे मंदिरात वाघावर आरूढ असलेले वाघजाई ची मूर्ती आहे हिला पिंगलाई असेही म्हणतात या मुळे या गावास पिंगोरी नाव मिळाल्याचे मानले जाते. या मंदिराची मागे थोडे बाजूला एक शिव मंदिर आहे. शिव मंदिराची समोर वाघजाई मंदिराचे बाजूस एक स्मारक छत्री असून त्यात प्रतिमा आहेत. ग्वालियर चे शिंदे घराणे मुळचे महाराष्ट्रातील या घराण्याची एक शाखा या ठिकाणी वास्तव्य करीत होती त्यांचे मधील कोणाची तरी ही छत्री असल्याचे ग्रामस्थ सांगतात गावा मध्ये त्यांचा एक वाडा ही आहे. मंदिराचे प्रवेशद्वारावर एक शिलालेख असून त्यावरून ईस १८१२ मध्ये सदर दरवाज्याचे काम बापुजीराव विठ्ठल शिंदे पाटील यांनी वाघाई चरणी केल्याचे दिसते


    *

    कोळविहीरे

    जेजुरी पासून ६ किमी अंतरावर असणारे कोळविहीरे गाव हे रामायणकार वाल्मिकी ऋषी यांची तपोभूमी असल्याचे मानले जाते वाल्मिकी हे जातीने कोळी होते पूर्वाश्रमी ते या परिसरामध्ये वाल्याकोळी म्हणून वाटमारीचा धंदा करीत येथे असलेले एक विहीर वाल्या कोळ्याची म्हणून प्रसिद्ध होती या वरून या गावास कोळविहीरे असे नाव मिळाले. वाटमारी करताना वाल्या कोळ्यास नारादमुनीचा अनुग्रह मिळाला व त्याने तप आरंभले व वाल्याचा पुढे वाल्मिकी झाला. त्यांनी ज्या ठिकाणी तप केले त्या ठिकाणी दुर्मिळ असा पाडळी चा महावृक्ष आजही उभा असून तो तप करताना त्यांनी हाती घेतलेल्या काठी पासून निर्माण जाहला अशी जनश्रुती आहे


    *

    हरणी

    harni
    जेजुरी पासून १८ किमी असलेल्या हरणी गावापासून २.५ किमी अंतरावरील डोंगरास महादेवाचा डोंगर म्हणून ओळखतात समुद्र सपाटी पासून ७४० मीटर उंच टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे गाडी रस्ता थेट मंदिरा पर्यंत पोहोचतो मंदिराची रचना दगडी मंडप व गर्भगृह अशी असून गर्भगृहात द्विलिंग असून ते शंकर व पार्वतीचे असल्याचे सांगतात, एका भक्ता मुळे देव शिखर शिगनापूर अथवा सोमेश्वर येथून या ठिकाणी आल्याचे सांगीतले जाते. या मंदिरा मागील टेकडीवर हरणाई देवी चे मंदिर आहे या ठिकाणची ही आद्य देवता हिचे नावावरून गावास हरणी नाव मिळाले.हरणाई मंदिराचे मागील बाजूस काही अंतरावर एक नाथ पंथीय समाधी असून ती कानिफनाथाची असल्याचे सांगितले जाते. चैत्र शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या दरम्यान येथे यात्रा भरते.


    *

    सोमेश्वर ( करंजे)

    someshwar
    जेजुरी पासून २५ किमी अंतरावर असणारे हे मंदिर सोमायाचे करंजे म्हणून ओळखले जाते एका भव्य प्राकारात येथे सोमेश्वरचे दगडी मंदिर होते. याचे गर्भगृह कायम ठेऊन आत्ता या मंदिराला आधुनिक रूप प्राप्त झाले आहे . मंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना असून गर्भगृहात सोमेश्वरचे शिवलिंग आहे. सती मालुबाई चे भक्तीने सोमनाथाचे पुजे करिता तिलानेण्या करिता रात्री विमान येत असे.एके दिवशी तीचा पती संशयाने पाठलाग करीत विमानाला धरून सोरटी सोमनाथला पोहचला व ती परतताना तेथेच राहिला. आणि तीच्या आयुष्याची परवड सुरु झाली तरी तिने भक्ती सोडली नाही. शेवटी देव तिचे भक्ती साठी येथे प्रगट झाले. व ती शिवतत्वात विलीन झाली अशी जनश्रुती आहे. संपूर्ण श्रावण महिना येथे यात्रा यात्रा असते श्रावणी सोमवारी मोठी यात्रा भरते. या कालावधीत मालुबाईस दिलेल्या वचना प्रमाणे आजही देव सर्प रूपाने प्रगटतात अशी लोकश्रद्धा आहे


    *

    श्री ज्योतीलिंग ( गुळुंचे)

    gulunche
    जेजुरी पासून २५ किमी अंतरावर गुळुंचे गावी असणारे हे मंदिर याची मंडप व गर्भगृह अशी रचना आहे गर्भगृहात शिवलिंग आहे. हे मंदिर येथे कार्तिक द्वादशीस भरणाऱ्या ‘ काटे बारस’ या यात्रे साठी विशेष प्रसिद्ध आहे या दिवशी बाभळीच्या काट्यांचे फांद्यांचे मोठे ढिगावर भाविक भक्त उघड्या अंगाने अंग झोकून उड्या मारतात


    *

    कुमजाई (टेकवडी)

    kumjai
    जेजुरी पासून २१ किमी अंतरावर असलेल्या टेकवडी गावा पासून ५ किमी अंतरावर कुमजाई देवीचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंडप, गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात खोलात उतरून जावे लागते. खाली एक शिवलिंग असून मागील बाजुस खाली व वरील कोनाड्यात महिषासुर मर्दीनी कुमजाई च्या मूर्ती आहेंत. भुलेश्वराचे पत्नी कुमजाई येथे त्याचे वर रुसून येऊन राहिल्याचे जनश्रुती आहे . मंदिराची आजूबाजूस इतर देवतांचे घुमटी आहेंत


    *

    राजराजेश्वर मंदिर ( आंबळे )

    amble
    जेजुरी पासून १८ किमी अंतरावरील आंबळे गावात एका उधवस्त मोठ्या प्राकारात हे दगडी बांधकामातील पूर्वाभिमुख मंदिर आहे. मंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना असून मंडप नक्षीकामाने युक्त आहे. कामावरून हे मंदिराचे काम पेशवाई काळातील आहे हे निश्चीत. गर्भगृहात शिवलिंग असून मागील बाजूस शंकर पार्वती यांची अलीगन मूर्ती आहे. मंदिरावरील कळसाचे काम विटांचे असून भग्न अवस्थेत आहे मंदिराचे मागे राम, कृष्ण, व तुळजाभवानी गणपती यांची मंदिरे आहेंत. गावा मध्ये अनेक पुरातन भव्य वाडे असून गावाचा गावकोस आजही काही प्रमाणात उभा आहे.


    *

    जवळार्जुन

    jawlarjun
    जेजुरी पासून ६ किमी अंतरावर असलेले गाव या कर्हा नदी काठी पुर्व तटावर पूर्वाभिमुख महादेवाचे मंदिर आहे .पांडेश्वर येथे यज्ञ करणाऱ्या पांडवानी गंगा जलासाठी चतुर्मुखा वरील ब्रह्मदेवाचा कमंडलू लवंडला त्यातून कर्हा निर्माण झाली. तपोभंगाने क्रोधीत ब्रम्हदेव अर्जुनाचा पाठलाग करू लागले. ब्रम्हदेव जवळ आले की अर्जुन आपल्या हातातील बेल अक्षता खाली टाकीत असे त्या ठिकाणी शिवलिंग निर्माण होत असे त्याची पुजा करून ब्रम्हदेव अर्जुनाचा पाठलाग पुन्हा सुरु करीत या पद्धतीने कर्हा नदी काठी अनेक शिवलिंग निर्माण झालेची जनश्रुती आहे. या मधील हे एक शिवलिंग अर्जुन पांडेश्वरा जवळ आलेवर तयार जाहलेले शिवलिंग म्हणून हे जवळार्जुन शिवलिंग या वरूनच या गावास जवळार्जुन नाव मिळाले आहे










     
     

    No comments:

    Post a Comment

    मनसर

     प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : नागपुर उंची : १२०० फुट ...