ढवळगड - एक खुलासा
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात वसलेल्या ढवळगड ह्या किल्ल्यावरील अवशेषांची नोंद घेऊन व तो दुर्गप्रेमींसाठी प्रकाशात आणल्याबद्दल अनेक जणांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. ढवळगड किल्ल्यावर मी फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदा दिलेल्या भेटीत किल्ल्यावरचे तटबंदी, पडलेला दरवाजा, मेटांच्या जागा, पाण्याची टाकी, मंदिर इत्यादी अवशेष दिसल्यावर इतक्या सुंदर किल्ल्याच्या अवशेषांची शास्त्रशुद्ध रीतीने तपासणी करून व त्यावर अभ्यास करून तो दुर्गप्रेमींसमोर मांडला पाहिजे असं लक्षात आल्याने त्या कामात डॉ. सचिन जोशी यांची मदत घेण्यात आली. दि. 19 मे 2018 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात सादर केलेल्या पुरंदर तालुक्यातील ढवळगड किल्ल्याच्या सादरीकरणाला प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आम्ही दुर्गमित्रांचे आभारी आहोत. काल भारत इतिहास संशोधक मंडळातील पाक्षिक सभेचे निमंत्रण व ऑनलाइन वृत्तपत्र, Whatsapp वरील काही मेसेजेस व वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या यावरून अनेक दुर्गप्रेमी मित्रांनी अभिनंदन केले. तसेच काही मित्रांनी फेसबुकवर ढवळगडाच्या "शोध" या शब्दाबद्दल विचारणा केली. त्याबाबत हा छोटासा खुलासा.
1. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ढवळगड हा किल्ला आधीपासूनच त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तो हरविला होता असे आमचे कोणाचेही मत नाही. गडावरील ढवळेश्वर मंदिर व ढवळगड संपूर्ण पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असल्याने स्थानिक ग्रामस्थ बांधवांनाही ते माहीत आहेच. आंबळी येथील ग्रामस्थांना याबद्दल माहिती होती हे आम्ही आमच्या सादरीकरणात सांगितले होते. तसेच सादरीकरण झाल्यावर आंबळी ग्रामस्थांचे आभारही मानले. त्यामुळे आम्ही हा किल्ला शोधलेला नाही.
2. संशोधन निबंध सादरीकरणाच्या वेळी आम्ही किल्ला शोधला असा कुठेही दावा न करता ढवळगडाच्या वास्तूंचा व अवशेषांचा सर्वांगीण अभ्यास केला आहे असे मांडले होते. ढवळगडाला "किल्ला" या स्थापत्यप्रकाराची सर्व परिमाणे वापरून तो दुर्गप्रेमींना परिचित करून देण्याचा प्रयत्न आहे असेच नमूद केले होते. आमच्या रिसर्च पेपरचा मथळा जरी "शोध ढवळगडाचा" असा होता. पण त्याविषयीचा खुलासा पाक्षिक सभेच्या सुरुवातीलाच केला होता. त्यावरील अवशेषांची नोंद घेऊन भटक्यांच्या नकाशावर आणण्याचे काम आम्ही केले इतकंच.
3. काही दुर्गप्रेमी मित्रांनी शिवाजीराव एक्के सरांच्या " पुरंदरचे धुरंधर"पुस्तकामध्ये ढवळगडाचा फोटो सकट उल्लेख आल्याचा खुलासा केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्के सर स्वतः या सादरीकरणाच्या वेळी त्या सभागृहात उपस्थित होते. त्यांनी यावेळी आमच्या संशोधनाविषयी कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी आमच्या या अभ्यासबद्दल शाबासकीची थापच दिली.एक्के सरांच्या पुस्तकात ढवळगडचा फक्त एक फोटो आहे. पण किल्ल्याची संपूर्ण माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.याच बरोबर जेष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे सर, आनंद पाळंदे सर, पुणे जिल्ह्यातील किल्ले या विषयावर लिखाण केलेले तापकीर सर यांच्या पुस्तकात या किल्ल्याची माहिती आलेली नाही.
एक्के सरांच्या पुस्तकात व इतर काही पुस्तकांमध्ये ढवळगडाचे निश्चित वर्णन आढळून न आल्याने आम्ही त्याच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून, त्याची मोजमापे घेऊन, त्याची शास्त्रशुद्ध रेखाटने ( Drawings) करून, त्यांची पुरातत्वीय पद्धतीने नोंद घेऊन ती संशोधनाच्या व्यासपीठावर मांडली होती. तसेच त्या किल्ल्याचा कालखंड व तेथील सर्व अवशेष याची माहिती लोकांसमोर आणली. एक्के सरांच्या म्हणण्यानुसार त्या किल्ल्याची ऐतिहासिक दृष्ट्या (घटना वगैरे) फारशी माहिती उपलब्ध नसल्याने आणि त्यांच्या मूळ संशोधनाचा विषय पुरंदर परिसर हा असल्याने त्यांनी ढवळगडावर लिखाण केले नाही. त्यामुळे कदाचित त्या पुस्तकात त्या फोटोपुरता व उल्लेखापुरता ढवळगड मर्यादित राहिला व त्यावरील अवशेषांवर विस्तृत लिखाण झाले नसल्याने त्याची नोंद दुर्गप्रेमींच्या नकाशावर आली नसावी. पण त्यांनी यासंदर्भात केलेल्या प्रदीर्घ कामाचा आदर आहे.
४. मग आता आम्ही काय वेगळं केलं ??
तर याआधी ढवळगडावर पुरातत्वीय दृष्ट्या शास्त्रशुद्ध संशोधन झालेले नव्हते व ते कुठेही प्रकाशित नसल्याने ढवळगड हा तमाम दुर्गप्रेमींच्या तसा विस्मृतीतच गेला होता. ढवळगडाला आजवर अनेकांनी विविध कारणासाठी भेट दिली असेलही पण त्याच्या सर्व अवशेषांचा अभ्यास व त्यांची नोंद कुठेही प्रकाशित झालेली नव्हती. त्यामुळे हा किल्ला ट्रेकर्सच्या व दुर्गप्रेमींच्या यादीत समाविष्ट झाला नव्हता. तसेच पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्येही ढवळगडाची "किल्ला" म्हणून नोंद नाही. त्यामुळे कदाचित आमच्या अभ्यासानंतर आता याची नोंद इतर किल्ल्यांप्रमाणे ‘किल्ला’ म्हणून शासकीय गॅझेटियरमध्ये होऊ शकेल.
५. आम्ही काय नवीन केले ?
ढवळगड किल्ल्याचा अभ्यास करताना गडावर पुढील अवशेष दिसून आले. पाण्याची दोन टाकी(त्यापैकी एक खांब टाके), गडाबाहेर एक टाके, मेट्याच्या दोन जागा, तेथील गणेश मंदिर आणि पाण्याचे टाके, दुसऱ्या मेटावरील चुन्याचा घाणा, तेथील राहत्या घरांचे अवशेष, गडाची तटबंदी. त्यात उभे असलेले बुरुज, उभे नसलेले बुरुज, देवडी, कमानीचे दगड, तटबंदीमध्ये बांधलेली खोली ( तेथे सध्या मंदिर झाले आहे), गडावरील विटांची, दगडाची बांधकामे, तेथे मिळालेले खापरांचे तुकडे, इ. अवशेषांची आम्ही तेथे जाऊन नोंद केली. सर्व वास्तुंची रेखाटने तयार केली. हे काम यापूर्वी कोणी केल्याचे आमच्या तरी माहितीत नाही. किल्ल्याचा उल्लेख त्रोटक स्वरुपात अनेक अभ्यासकांनी केला होता. उदा. श्री. कृ.वा. पुरंदरे, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, श्री. एक्के सर, श्री. अभिजित बेल्हेकर इ. पण वर उल्लेख केलेल्या अवशेषांचे पुरातत्वीय सर्वेक्षण आणि त्याचा सखोल अभ्यास आजपर्यंत झालेला नव्हता. तो करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
काही वृत्तपत्रांच्या बातमीमध्ये आणि फेसबुक पोस्टमध्ये चुकून "किल्ला शोधला" हे शब्द वापरले गेल्याने कदाचीत काही दुर्गप्रेमींचा गैरसमज झाला असावा. त्या बातमीतील व पोस्टमधील शब्दांमुळे जो गैरसमज झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे ती पोस्ट आम्ही लगेचच दुरुस्त केली.
आमच्या सादरीकरणाच्या वेळी अनेक भटक्या मित्रांनी उपस्थिती लावली तसेच त्यांनी संशोधनाविषयीचे वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
त्यामुळे शेवटी हाच खुलासा करावासा वाटतो की ढवळगड हा किल्ला आम्ही शोधला नसून त्याच्या वास्तूंची पुरातत्वीय अंगाने नोंद घेऊन, त्यांची रेखाटने करून व त्या नकाशावर मांडून त्या लोकांसमोर आणल्या व ढवळगड हा काहीसा विस्मृतीत गेलेला किल्ला पुन्हा एकदा भटक्यांच्या नकाशावर आणला. ज्या दुर्गप्रेमींना हा किल्ला माहीत नव्हता त्यांनी आता ढवळगड आपल्या यादीत नोंदवल्याने या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे व आमच्या अभ्यासाचं तसेच किल्ल्याच्या अवशेषांची नोंद घेण्याच्या कष्टाचं चीज झालं आहे. त्यामुळे हा शोध नसून विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची नोंद घेऊन तो भटक्यांच्या नकाशावर आणल्याचा खुलासा मी यानिमित्ताने करतो व या चर्चेला पूर्णविराम देतो.
ओंकार ओक
१) पुरंदरे, कृ. वा. किल्ले पुरंदर आणि परिसर, पुणे, १९४०.
२) https://www.discovermh.com/dhavalgad/
३) https://maheshnilangekar.blogspot.com
४) साने, का. ना. सभासद बखर, आवृत्ती तिसरी, पुणे, १९२३.
५) एक्के, शिवाजीराव, पुरंदरचे धुरंदर, पुणे, २०१६.
६) जोशी, सचिन विद्याधर; ओक, ओंकार, ‘ढवळगड : एक पुरातत्त्वीय अभ्यासʼ, त्रैमासिक, भारत इतिहास संशोधक मंडळ, वर्ष ९४, अंक १ ते ४, पुणे, २०१८.
७) www.durgbharari.in हि बेवसाईट
इतिहासात फारशी नोंद नसलेला ढवळगड पुरंदर तालुक्यातील अंबाळे गावाजवळ असलेला किल्ला. फेसबुक च्या एक पोस्ट वरून या किल्ल्याबद्दल समजलं .भेटलेल्या माहितीनुसार समजत की, या किल्ल्याबद्दल इतिहासकार कृष्णाजी पुरंदरे यांच्या 1932 साली प्रकाशित झालेल्या " किल्ले पुरंदर " थोडीफार संदर्भ येतो.
गडावर पाहण्याची ठिकाणे -
किल्ल्यावर जाताना पायथ्याशी एक चुन्याचा घाना लागतो. थोडं अंतर वर चालून
आलं की हनुमानाची वैशिष्ट्य पूर्ण मूर्ती पाहायला मिळते जी दगडाच्या दोन्ही
बाजूला कोरलेली आहे.
पायऱ्या चढून वर आलं की एक छोटंसं गणपती मंदिर आहे . गणपती मंदिर पासून काही पायऱ्या चढलं की आपण पोहचतो गडाच्या दरवाज्या जवळ . दरवाजाची थोडी पडझड झाली आहे , शेजारीच एक बुरुज ही दिसतो .दरवाज्यातून पुढे आले की दोन पाण्याची टाके आहेत.
गडावर ढवळेश्वराचं मंदिर , बहुदा याच मंदिरावरून गडाला ढवळगड अस नाव पडल असावे.
गडाच्या बांधणी वरून समजत की हा एकदा पेशवेकालीन किल्ला असावा, जो निगरणीचा किल्ला म्हणून बांधला असावा जसकी जवळचेच मल्हारगड आणि भुलेश्वर .
गडाच्या अधिक माहिती खाली दिलेला विडिओ पहा आणि अजून ही असाच गडांच्या माहिती साठी "Subscribe" करा SPOTVAR
धन्यवाद!!
https://youtu.be/-Yp0HE0ylmY
ढवळगडासंदर्भात काही माहिती देतो. गाव -आंबळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे
समुद्रसपाटीपासून उंची 885 मीटर, पुरंदर दुर्ग च्या उत्तरेस, भुलेश्वर
डोंगर रांगेवर उभा ठाकलेला, आत्तापर्यंत चा दुर्ग. गिरीमित्र ओंकार ओक आणि
इतिहास संशोधक श्री सचिन जोशी यांनी अथक प्रयत्न करून हा गड शोधला. पुणे-
फुरसुंगी -दिवे घाट- सासवड - सिंगापूर - वाघापूर - आंबळे असे आपण जाउ शकतो.
अतिप्राचीन गाव, सरलष्कर दरेकर यांचं गाव, महान पराक्रमी दरेकर घराणे,
यांचे 2 अतिभव्य असे वाडे आहेत, सुसज्ज दरवाजे, तटबंदी, गावातील मंदिरे तर
काय बोलावे जबरदस्त भैरवनाथ मंदिर, राजेश्वर मंदिर, राम मंदिर,
लक्ष्मीनारायण मंदिर, काळा मारुती, हनुमान मंदिर, विठ्ठल मंदिर, गरुड
मंदिर, गावात अष्टमी चैत्र वैद्य महिण्यात मोठी यात्रा असते. गावात दरेकर,
जगताप, काळे, कुंजीर, बधे,गायकवाड, शेंडगे, रोकडे, शेम्बडे, बिचकुळे,
थोरात, ढोणे, ढोले, होले, शेख, अशी आडनाव मिळून 2000 लोकसंख्या आहे. गावात
माहिती घेतली असता ढवळगड चा ढवलेश्वर झाला असे सांगतात. पाणंद रस्ताने
गेल्यावर आपल्याला ढवळगड दिसतो, गावच्या पश्चिम उत्तरेस उभा राहिला आहे.
गडाकडे निघाल्यावर अगदी 5 मिनिट अंतरावर वेगळ्या धाटणीचा हनुमान पाहायला
मिळतो , एकाच दगडात दोन्ही बाजूंनी कोरीव मारुतीराया आहे, अप्रतिम आहे. मग
थोडं पुढं गेल्यावर जुजबी तटबंदी मग गणेश मूर्ती दिसते अप्रतिम आहे. मग
अर्धा पडलेला दरवाजा, शेजारी एक बुरुज, वर विटांचे बांधकाम, आणि शेजारी
लागून उंच तटबंदी आहे. त्याला लागून 3 दगडी खोल्या आहेत. दरवाजा पुरातन
अस्तिव दाखवून देतो. मग पुढं गेल्यावर एक कोरीव कमी बांधीव विहीर टाक आहे
अंदाजे 20 फूट खोल. तसच पुढं एक खांब टाक आहे 15 फूट बाय20 फूट एक कोरीव
खांब दिसतो. बरोबर मंदिर दरवाजा समोर आहे, सुंदर आहे. मग मुख्य मंदिर
ढवलेश्वर अप्रतिम कोरीव पिंड, शिवलिंग खूप खूप खूप सुंदर आहे. सभामंडप,
नंदी अफलातून आहे, मुख्य गाभारा तर सुबक आहे. 2 दरवाजे ,मुख्य दरवाजा सगळं
कसं अप्रतिम आहे. पूर्वेला दौलतमंगळ गड (भुलेश्वर मंदिर), दक्षीण दिशेने
पुरंदर वज्रगड, पश्चिमेला मल्हार गड उत्तरेस रेल्वे रूळ आणि 3 बोगदे
.संपुर्ण गड फेरीत या व्यतिरिक्त काही ही अवशेष सापडले नाही. नैसर्गिक
तटबंदी, बांधीव नाही. छोटेखानी टेहळणी दुर्ग असावा.
हा गड उजेडात येत असताना काही वाद झाले. ओंकार ओक यांचा प्रतिसाद उपलब्ध होउ शकला.
ढवळगड - एक खुलासा
पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यात वसलेल्या ढवळगड ह्या किल्ल्यावरील
अवशेषांची नोंद घेऊन व तो दुर्गप्रेमींसाठी प्रकाशात आणल्याबद्दल अनेक
जणांचे अभिनंदनाचे फोन येत आहेत. ढवळगड किल्ल्यावर मी फेब्रुवारी महिन्यात
पहिल्यांदा दिलेल्या भेटीत किल्ल्यावरचे तटबंदी, पडलेला दरवाजा, मेटांच्या
जागा, पाण्याची टाकी, मंदिर इत्यादी अवशेष दिसल्यावर इतक्या सुंदर
किल्ल्याच्या अवशेषांची शास्त्रशुद्ध रीतीने तपासणी करून व त्यावर अभ्यास
करून तो दुर्गप्रेमींसमोर मांडला पाहिजे असं लक्षात आल्याने त्या कामात डॉ.
सचिन जोशी यांची मदत घेण्यात आली. दि. 19 मे 2018 रोजी भारत इतिहास संशोधक
मंडळात सादर केलेल्या पुरंदर तालुक्यातील ढवळगड किल्ल्याच्या सादरीकरणाला
प्रोत्साहन देऊन आमचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल आम्ही दुर्गमित्रांचे
आभारी आहोत. काल भारत इतिहास संशोधक मंडळातील पाक्षिक सभेचे निमंत्रण व
ऑनलाइन वृत्तपत्र, Whatsapp वरील काही मेसेजेस व वृत्तपत्रांमध्ये आलेल्या
बातम्या यावरून अनेक दुर्गप्रेमी मित्रांनी अभिनंदन केले. तसेच काही
मित्रांनी फेसबुकवर ढवळगडाच्या "शोध" या शब्दाबद्दल विचारणा केली. त्याबाबत
हा छोटासा खुलासा.
1. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की ढवळगड हा किल्ला आधीपासूनच त्या
ठिकाणी अस्तित्वात आहे. तो हरविला होता असे आमचे कोणाचेही मत नाही. गडावरील
ढवळेश्वर मंदिर व ढवळगड संपूर्ण पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असल्याने
स्थानिक ग्रामस्थ बांधवांनाही ते माहीत आहेच. आंबळी येथील ग्रामस्थांना
याबद्दल माहिती होती हे आम्ही आमच्या सादरीकरणात सांगितले होते. तसेच
सादरीकरण झाल्यावर आंबळी ग्रामस्थांचे आभारही मानले. त्यामुळे आम्ही हा
किल्ला शोधलेला नाही.
2. संशोधन निबंध सादरीकरणाच्या वेळी आम्ही किल्ला शोधला असा कुठेही दावा न
करता ढवळगडाच्या वास्तूंचा व अवशेषांचा सर्वांगीण अभ्यास केला आहे असे
मांडले होते. ढवळगडाला "किल्ला" या स्थापत्यप्रकाराची सर्व परिमाणे वापरून
तो दुर्गप्रेमींना परिचित करून देण्याचा प्रयत्न आहे असेच नमूद केले होते.
आमच्या रिसर्च पेपरचा मथळा जरी "शोध ढवळगडाचा" असा होता. पण त्याविषयीचा
खुलासा पाक्षिक सभेच्या सुरुवातीलाच केला होता. त्यावरील अवशेषांची नोंद
घेऊन भटक्यांच्या नकाशावर आणण्याचे काम आम्ही केले इतकंच.
3. काही दुर्गप्रेमी मित्रांनी शिवाजीराव एक्के सरांच्या " पुरंदरचे
धुरंधर"पुस्तकामध्ये ढवळगडाचा फोटो सकट उल्लेख आल्याचा खुलासा केला. सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे एक्के सर स्वतः या सादरीकरणाच्या वेळी त्या
सभागृहात उपस्थित होते. त्यांनी यावेळी आमच्या संशोधनाविषयी कोणताही आक्षेप
घेतला नाही. उलट त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी आमच्या या
अभ्यासबद्दल शाबासकीची थापच दिली.एक्के सरांच्या पुस्तकात ढवळगडचा फक्त एक
फोटो आहे. पण किल्ल्याची संपूर्ण माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.याच
बरोबर जेष्ठ दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे सर, आनंद पाळंदे सर, पुणे
जिल्ह्यातील किल्ले या विषयावर लिखाण केलेले तापकीर सर यांच्या पुस्तकात या
किल्ल्याची माहिती आलेली नाही.
एक्के सरांच्या पुस्तकात व इतर काही पुस्तकांमध्ये ढवळगडाचे निश्चित वर्णन
आढळून न आल्याने आम्ही त्याच्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून, त्याची
मोजमापे घेऊन, त्याची शास्त्रशुद्ध रेखाटने ( Drawings) करून, त्यांची
पुरातत्वीय पद्धतीने नोंद घेऊन ती संशोधनाच्या व्यासपीठावर मांडली होती.
तसेच त्या किल्ल्याचा कालखंड व तेथील सर्व अवशेष याची माहिती लोकांसमोर
आणली. एक्के सरांच्या म्हणण्यानुसार त्या किल्ल्याची ऐतिहासिक दृष्ट्या
(घटना वगैरे) फारशी माहिती उपलब्ध नसल्याने आणि त्यांच्या मूळ संशोधनाचा
विषय पुरंदर परिसर हा असल्याने त्यांनी ढवळगडावर लिखाण केले नाही. त्यामुळे
कदाचित त्या पुस्तकात त्या फोटोपुरता व उल्लेखापुरता ढवळगड मर्यादित
राहिला व त्यावरील अवशेषांवर विस्तृत लिखाण झाले नसल्याने त्याची नोंद
दुर्गप्रेमींच्या नकाशावर आली नसावी. पण त्यांनी यासंदर्भात केलेल्या
प्रदीर्घ कामाचा आदर आहे.
४. मग आता आम्ही काय वेगळं केलं ??
तर याआधी ढवळगडावर पुरातत्वीय दृष्ट्या शास्त्रशुद्ध संशोधन झालेले नव्हते व
ते कुठेही प्रकाशित नसल्याने ढवळगड हा तमाम दुर्गप्रेमींच्या तसा
विस्मृतीतच गेला होता. ढवळगडाला आजवर अनेकांनी विविध कारणासाठी भेट दिली
असेलही पण त्याच्या सर्व अवशेषांचा अभ्यास व त्यांची नोंद कुठेही प्रकाशित
झालेली नव्हती. त्यामुळे हा किल्ला ट्रेकर्सच्या व दुर्गप्रेमींच्या यादीत
समाविष्ट झाला नव्हता. तसेच पुणे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्येही ढवळगडाची
"किल्ला" म्हणून नोंद नाही. त्यामुळे कदाचित आमच्या अभ्यासानंतर आता याची
नोंद इतर किल्ल्यांप्रमाणे ‘किल्ला’ म्हणून शासकीय गॅझेटियरमध्ये होऊ शकेल.
५. आम्ही काय नवीन केले ?
ढवळगड किल्ल्याचा अभ्यास करताना गडावर पुढील अवशेष दिसून आले. पाण्याची
दोन टाकी(त्यापैकी एक खांब टाके), गडाबाहेर एक टाके, मेट्याच्या दोन जागा,
तेथील गणेश मंदिर आणि पाण्याचे टाके, दुसऱ्या मेटावरील चुन्याचा घाणा,
तेथील राहत्या घरांचे अवशेष, गडाची तटबंदी. त्यात उभे असलेले बुरुज, उभे
नसलेले बुरुज, देवडी, कमानीचे दगड, तटबंदीमध्ये बांधलेली खोली ( तेथे सध्या
मंदिर झाले आहे), गडावरील विटांची, दगडाची बांधकामे, तेथे मिळालेले
खापरांचे तुकडे, इ. अवशेषांची आम्ही तेथे जाऊन नोंद केली. सर्व वास्तुंची
रेखाटने तयार केली. हे काम यापूर्वी कोणी केल्याचे आमच्या तरी माहितीत
नाही. किल्ल्याचा उल्लेख त्रोटक स्वरुपात अनेक अभ्यासकांनी केला होता. उदा.
श्री. कृ.वा. पुरंदरे, आदरणीय बाबासाहेब पुरंदरे, श्री. एक्के सर, श्री.
अभिजित बेल्हेकर इ. पण वर उल्लेख केलेल्या अवशेषांचे पुरातत्वीय सर्वेक्षण
आणि त्याचा सखोल अभ्यास आजपर्यंत झालेला नव्हता. तो करण्याचा प्रयत्न आम्ही
केला.
काही वृत्तपत्रांच्या बातमीमध्ये आणि फेसबुक पोस्टमध्ये चुकून "किल्ला
शोधला" हे शब्द वापरले गेल्याने कदाचीत काही दुर्गप्रेमींचा गैरसमज झाला
असावा. त्या बातमीतील व पोस्टमधील शब्दांमुळे जो गैरसमज झाला त्याबद्दल
आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे ती पोस्ट आम्ही लगेचच दुरुस्त केली.
आमच्या सादरीकरणाच्या वेळी अनेक भटक्या मित्रांनी उपस्थिती लावली तसेच
त्यांनी संशोधनाविषयीचे वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर
देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
त्यामुळे शेवटी हाच खुलासा करावासा वाटतो की ढवळगड हा किल्ला आम्ही शोधला
नसून त्याच्या वास्तूंची पुरातत्वीय अंगाने नोंद घेऊन, त्यांची रेखाटने
करून व त्या नकाशावर मांडून त्या लोकांसमोर आणल्या व ढवळगड हा काहीसा
विस्मृतीत गेलेला किल्ला पुन्हा एकदा भटक्यांच्या नकाशावर आणला. ज्या
दुर्गप्रेमींना हा किल्ला माहीत नव्हता त्यांनी आता ढवळगड आपल्या यादीत
नोंदवल्याने या गोष्टीचा आम्हाला मनस्वी आनंद आहे व आमच्या अभ्यासाचं तसेच
किल्ल्याच्या अवशेषांची नोंद घेण्याच्या कष्टाचं चीज झालं आहे. त्यामुळे हा
शोध नसून विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची नोंद घेऊन तो भटक्यांच्या नकाशावर
आणल्याचा खुलासा मी यानिमित्ताने करतो व या चर्चेला पूर्णविराम देतो.
ओंकार ओक
ढवळगड गडावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. पुणे सोलापूर महामार्गाने गेल्यास
उरुळी कांचन मधून आतल्या बाजूला नऊ किमी गेलं की कोल्हापूर रेल्वे मार्ग
लागतो अन आंबळे गाव लागतं त्या गावातून गडावर पायवाट जाते. दुसरं म्हणजे
सासवड रोड ने गेल्यास काळेवाडी मधून आतल्या बाजूला जाऊन दोन चार गावे मागे
टाकली कि आंबळे गावात पोहोचतं. गाव तसं छोटंसं, गावात स्वराज्यातील सरलष्कर
प्रमुख दरेकर यांचा भला मोठा वाडा आहे आणि बरेच लहान मोठे वाडे आहेत.
आंबळे गावातून गेल्यास गाडी गडावर जाते. गडावर प्रवेश केल्यास प्रथमतः
१)चुन्याचा घाना दिसतो.
२)पवनसुत हनुमान मूर्तीचे अखंड दोन्ही बाजूंनी शिल्प दिसते.
३)गणपती बाप्पा मंदिर आहे.
४) समोरच बुरुज व भग्नावस्थेत असणारा दरवाजा आहे.
५)तटबंदी व पाण्याच्या टाक्या आहेत.
६)धवळेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर आहे.
असा हा गडाचा परिसर दिसतो. गडाच्या चारही बाजूंनी गावं वसलेली आहेत.
माझ्या अंदाजानुसार भुलेश्वर पर्वत रांगेतील शेवटच्या टेकडीवर वसलेला हा गड
टेहाळणीच्या कामी येत असावा. आसपासच्या पंधरा किलोमीटर अंतरावरील प्रदेश
गडावरून दिसतो.
https://www.discovermh.com/dhavalgad/
पावसाळी भटकंती - धवलगड
अजून
म्हणावा असा पाऊस नसल्याने, खूप गरम होत असल्यामुळे आणि सहकुटुंब
असल्यामुळे आम्ही अगदी छोटा असा गड निवडला होता. पुण्यापासून जवळपास ५०
किमी च्या अंतरावर भुलेश्वर मंदिराजवळ काहीसा दुर्लक्षित आणि निर्जन असा हा
गड.
पुणे सासवड यवत असा मार्ग घेतला
होता बोपदेव घाट उतरल्यानन्तर ऑस्करवाडी मिसळ ला थांबून नाश्ता केला आणि
तासाभरात गडाच्या पायथ्याजवळ गेलो तोच मुलांना हरीण दिसले. मग गाडी थांबवून
आम्ही हरीण पाहत बसलो त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढले. हरीण दिसल्यामुळे
मुलं भलतीच खुश झाली होती ते पाडस बहुतेक त्याच्या कळपापासून लांब आला होता
आम्ही दिसल्यामुळे मग ते पळून गेला. १५ - २० मिनिटांमध्ये आम्ही टेकडीच्या
माथ्यावर पोचलो. गडावर विशेष असे काहीच अवशेष शिल्लक नाहीत. अगदी अर्ध्या
पाऊण तासात गड पाहून होतो. ढवळेश्वर मंदिर आणि एक पडकी भिंत. पण स्थानिक
लोक बहुतेक रोज गडावर येत असावेत कारण महादेवाच्या पिंडी ला ताजी फुले
वाहून यथोचित पूजा केलेली दिसत होती गडावरून खाली उतरून आम्ही गावात एक
वाडा आणि मंदिर आहे त्याला भेट दिली आणि पुढे आम्ही पुरंदर ला गेलो . अगदी
अर्ध्या दिवसात होईल असा हा ट्रेक किंवा सहकुटुंब भटकंती आणि आराम
करण्यासाठी एकदम निवांत जागा. शनिवार रविवार पण अतिशय कमी गर्दी.
मिसळ
हरीण
दोन्ही बाजूने कोरलेली मूर्ती
गडाची भिंत
गणेश मूर्ती
ढवळेश्वर मंदिर
शिवलिंग
फुलपाखरू
आजूबाजूचा परिसर
सहजच
वाडा
वाड्यासमोरील मंदिर
वाड्यासमोरील मंदिर
निसर्ग
http://www.misalpav.com/node/50532
संडे भटकंतीनामा - ढवळगड व किल्ले दौलतमंगळ (भुलेश्वर मंदिर)
![]() |
| प्रवेशद्वाराल लागून असलेली तटबंदी |
![]() |
गढीला असणाऱ्या प्रवेशद्वारंपैकी एक प्रेवशद्वार |
![]() |
ढवळगडाचे प्रवेशद्वार |
![]() |
भुलेश्वर मंदिर |
![]() |
| नंदी |
![]() |
भुलेश्वर मंदिरात असलेले रामायणातील प्रसंगाचे शिल्प |
![]() |
गर्भगृहातील शिवलिंगद्वारपालकिल्ले दौलतमंगळच्या बुरुजांचे अवशेषकिल्ले ढवळगडढवळेश्वर मंदिरढवळगडावर असलेला चुन्याचा घाणाहनुमान मूर्ती |
https://maheshnilangekar.blogspot.com/2020/04/blog-post_95.html
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील डोंगरी किल्ला. हा किल्ला आंबळे गावाजवळ भुलेश्वरच्या डोंगर रांगेवर, समुद्रसपाटीपासून ८६४ मी. (पायथ्यापासून १०० मी.) उंचीवर वसलेला आहे. मराठी साम्राज्यातील रणधुरंधर सरदार खंडेराव दरेकरांमुळे आंबळे या गावाची इतिहासात नोंद आहे. गावातच दरेकारांचा मोठा वाडा आहे. गावाच्या पाठीमागे म्हणजेच उत्तरेला ५ किमी. अंतरावर ढवळगड आहे.

किल्ल्यावर ढवळेश्वराचे मंदिर असून ते आंबळे गावापासून १३० मी. उंच डोंगरावर आहे. जिल्ह्याचे ठिकाण पुणे येथून ढवळगडाला जाण्यासाठी पुणे-सासवड–वनपुरी–सिंगापूर–पारगाव चौफुला–वाघापूर–आंबळे असा रस्ता आहे. सासवडपासून हे अंतर साधारणपणे १८ ते २० किमी. आहे. गावातून एक कच्चा रस्ता ढवळगडाच्या जवळपास अर्ध्या वाटेपर्यंत गेला आहे. गडाचा दुसरा मार्ग उरुळी कांचन गावातून असून जवळच असणारे डाळिंब हे गाव गडाच्या उत्तरेकडील पायथ्याला आहे. डाळिंब गावापासून गड माथा किंवा ढवळेश्वर मंदिर २५५ मी. उंचीवर आहे. डाळिंब गावापासून रेल्वेमार्ग पार करून १४० मी. चढून आल्यावर मेटाचे अवशेष दिसून येतात. या मेटावर खडकात खोदलेले आणि नंतर बांधलेले पाण्याचे टाके आहे. या टाक्याचा आकार साधारणतः १५ फूट x ८ फूट इतका आहे. मेटावरील मंदिरासमोर हे पाण्याचे टाके असून त्याचीही जुजबी दुरुस्ती झाली आहे. टाक्याशेजारीच झाडीमध्ये पत्र्याच्या छपराखाली पगडी घातलेली गणपतीची मूर्ती असून ती पेशवे काळातील असावी. कारण अशाच स्वरूपाची गणेश मूर्ती अहमदनगर येथील विशाल गणपती मंदिरात आहे. ढवळगडच्या माचीवरील या गणेश मंदिरासमोर एक शिवलिंग ठेवलेले दिसते.

किल्ल्यावर जाण्याच्या दोन मार्गांपैकी आंबळे गावाकडून येणाऱ्या मार्गावर राबता जास्त असतो. या वाटेवर माथ्याच्या खाली गडाचे दुसरे मेट आहे. या मेटावर बांधलेला चुन्याचा घाणा आजही अस्तित्वात आहे. घाण्याशेजारी जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात. घाण्यापासून पुढे किल्ल्याच्या मुख्य चढावर हनुमानाचे शिल्प कोरलेला दगड आहे. एकाच दगडात पाठीला पाठ लावून हनुमानाची दोन शिल्पे कोरलेली आहेत. गडाच्या दरवाजाजवळ गणपतीचे शिल्प एका घुमटीमध्ये ठेवलेले आहे. किल्ल्याचा दरवाजा अर्धा पडलेला असून त्या शेजारील अर्ध्या भागातील तटबंदीची भिंत आणि बुरूज उभे आहेत. दरवाजाची उंची ३.७ मी. असून अस्तित्वात नसलेल्या अर्ध्या कमानीचे दगड तेथेच खाली पडलेले आहेत. दरवाजातून आत उजवीकडे देवडी (पहारेकऱ्यांची खोली) आहे. मात्र सध्या या मूळ जागेत बदल करून ती निवासासाठी वापरल्याचे दिसते. देवडीच्या आतील बांधकाम पेशवेकालीन वाटते. कारण पेशवेकालीन विटांचा सररास वापर या बांधकामात केलेला दिसतो. तेथे आत एक खोली आहे. दरवाजात एका बाजूची बिजागरीची जागा राहिलेली असून अडसर लावण्याची एका बाजूची जागा तेथे दिसते. दरवाजापासून पूर्व पश्चिम १२ मी. लांब आणि १ मी. रुंद तटबंदी उभी असलेली दिसते.

दरवाजातून पुढे पूर्वेकडे एक बुजलेले पाण्याचे एक टाके दिसते. या टाक्याची नजीकच्या काळामध्ये डागडुजी करून त्याला चुन्याचा गिलावा केला आहे. टाक्याच्या बाहेरील बाजूस बांधकाम करून त्याला कठडा बांधला आहे. गडावरील सर्वांत मोठी वास्तू म्हणजे ढवळेश्वर महादेवाचे मंदिर. याचे बांधकाम दोन भागांत विभागलेले आहे, ते म्हणजे सभामंडप आणि गाभारा. मंदिराला बाहेरील बाजूंस गोमुखही आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचीही डागडुजी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. मंदिराच्या समोर म्हणजेच पूर्वेला पाण्याचे दुसरे टाके असून या टाक्यात खांब कोरलेला आहेत. या टाक्याची देखील दुरुस्ती झाल्याचे स्पष्टपणे दिसते. टाक्याला तसेच आतील खांबाला चुन्याचा गिलावा केलेला आहे. या टाक्याची लांबी रुंदी ३.१५ मी. x ४.३० मी. असून खोली ५.४८ मी. आहे. टाक्याच्या समोरील उतारावर तटबंदीचे भग्न झालेले अवशेष असून ते सहजासहजी दिसून येत नाहीत. गडाला सर्व बाजूंनी तटबंदी होती; परंतु काळाच्या ओघात नैसर्गिक आपत्तींमुळे ती ढासळलेली दिसते. पूर्वेकडील व उत्तरेकडील तटबंदीचे अवशेष देखील तुरळक प्रमाणात दिसतात. गडाच्या तटबंदीच्या खालून गडाला प्रदक्षिणा घालताना ठिकठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. गडाच्या उत्तरेकडील उतारावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. हे गडाच्या परिसरातील तिसरे टाके होय. साधारणपणे दहा फूट खोली असलेले हे टाके मार्च महिन्यात पूर्णपणे कोरडे होते. गडाच्या माथ्यावरून पश्चिमेकडे शिंदवण्याचा घाट दिसतो.
किल्ल्याच्या माथ्यावर ढवळेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला एक छोटी घुमटी व त्यापुढे नंदी असून हा भाग किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदीला लागून आहे. इतर अनेक किल्ल्यांवर तटबंदीमध्ये खोल्या असतात, तशा स्वरूपाची तटबंदीमध्ये असलेली खोली पश्चिमेकडील तटामध्ये दिसते. तट पडून गेल्याने ही फक्त खोली शिल्लक आहे. सध्या येथे एक मंदिर आहे. या खोली समोरच एक तुळशी वृंदावन आहे. मृत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ हे तुळशी वृंदावन बांधले असावे.
महाराष्ट्रात अनेक अशी देवस्थाने आहेत, ज्यांच्या भोवती तटबंदी असल्याने त्यांचा उल्लेख ‘गडʼ असा केला जातो. उदा., जेजुरीगड, कानिफनाथगड, सप्तशृंगीगड, साताऱ्याजवळील साखरगड इत्यादी. पण ही सगळी तटबंदीयुक्त देवस्थाने असून त्यांना ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ याची परिमाणे लागू होत नाहीत. ढवळगडाच्या बाबतीत प्राथमिक सर्वेक्षणामध्ये कोणालाही असे वाटण्याची शक्यता आहे. पण ढवळगड किल्ल्यावर असलेले अवशेष तो किल्ला असल्याचे दर्शवितात. त्यामुळे ढवळगड हा एक फक्त देवाचा गड नसून तो ‘किल्लाʼ किंवा ‘दुर्गʼ यांच्या व्याख्येत बसणारा व लष्करी महत्त्व असणारा गड आहे, असे निश्चित सांगता येते.
ढवळगडाचा सर्वांत पहिला उल्लेख इतिहास अभ्यासक कृ. वा पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर पुस्तकामध्ये आलेला आहे. इ. स. १९४० साली प्रकाशित झालेले हे पुस्तक पेशवे दप्तर मधील मोडी कागदपत्रांचे वाचन करून लिहिलेले असल्याने पुरंदर परिसराच्या अभ्यासासाठी प्राथमिक संदर्भ मानले जाते. पुस्तकात भुलेश्वर डोंगर रांगेचे वर्णन करताना मल्हारगड, भुलेश्वर उर्फ दौलतमंगळ व ढवळगड या किल्ल्यांचा उल्लेख केलेला असून त्यात हे तिन्ही किल्ले पुरंदर परिसरात असल्याचे नमूद आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या ग्रंथातही ढवळगडाचा उल्लेख आढळतो. पुरंदरचे धुरंदर या पुस्तकात ढवळगडाचे एक छायाचित्र शिवाजीराव एक्के यांनी दिले आहे. किल्ल्यावरील अवशेषांचे पुरातत्त्वीय सर्वेक्षण करून त्याची विस्तृत माहिती आणि किल्ला असल्याचे भक्कम पुरावे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या किल्ल्याचे विस्तृत वर्णन अन्य गड-किल्ले संबंधित ग्रंथांमध्ये आलेले नसल्याने हे संशोधन महत्त्वाचे ठरते.
ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही; पण मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा. याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बखरीमध्ये ‘ढोला’ गड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे. हा ढोलागड म्हणजे ढवळगड किल्ल्याचा अपभ्रंश असू शकतो; तथापि किल्ल्यावर कोणतेही शिवकालीन बांधकाम दिसत नाही. काळाच्या ओघात ते पडले असावे. ढवळगड आणि शेजारीच असलेला मल्हारगड या दोन किल्ल्यांच्या बांधकामामध्ये खूप साम्य आढळून येते. ढवळगड किल्ल्याचा बुरूज आणि मल्हारगड किल्ल्यावरील बुरूज यांत बरेच साम्य आहे. त्यामुळे हा किल्ला उत्तर पेशवाई कालखंडात बांधला असण्याची शक्यता जास्त आहे.
संदर्भ :
- एक्के, शिवाजीराव, पुरंदरचे धुरंदर, पुणे, २०१६.
- पुरंदरे, कृ. वा. किल्ले पुरंदर आणि परिसर, पुणे, १९४०.
- साने, का. ना. सभासद बखर, आवृत्ती तिसरी, पुणे, १९२३.
- जोशी, सचिन विद्याधर; ओक, ओंकार, ‘ढवळगड : एक पुरातत्त्वीय अभ्यासʼ, त्रैमासिक, भारत इतिहास संशोधक मंडळ, वर्ष ९४, अंक १ ते ४, पुणे, २०१८.
‘त्यांच्या’ संशोधनामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात ‘ढवळगडा’ची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:04 PM2018-05-19T20:04:50+5:302018-05-19T21:02:54+5:30
आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील गिर्यारोहकाला यश आले आहे.

‘त्यांच्या’ संशोधनामुळे महाराष्ट्राच्या दुर्गवैभवात ‘ढवळगडा’ची भर
Next
ठळक मुद्देपुरंदर तालुक्यातील आंबळे गावाजवळ हा ढवळगड वसलेला भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर सादरकिल्ल्यावर आजमितीस तटबंदी, बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव खांबटाकी, ऐतिहासिक अवशेष
पुणे:
महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गवैभवाची ख्याती जगप्रसिद्ध आहे. या
दुर्गवैभवाला अभिमान व पराक्रमाची एक ऋणानुबंधाची झालर आहे. त्यामुळे
सह्याद्रीच्या कुशीत दूरवर विखुरलेली ही दुर्गसंस्कृती गिर्यारोहकांसह
पर्यटकांना वारंवार खुणावत असते. मात्र, आजही महाराष्ट्रात कितीतरी किल्ले
असे आहेत जे अद्यापही अप्रकाशात आहेत. अशाच एका विस्मृतीत गेलेल्या
किल्ल्याची स्थाननिश्चिती करण्यात पुण्यातील एका गिर्यारोहकाला यश आले आहे.
ओंकार ओक असे या गिर्यारोहकाचे नाव आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या
दुर्गवैभवात आणखी एका किल्ल्याची भर पडली आहे. पुरंदर तालुक्यातील आंबळे
गावाजवळ हा ढवळगड वसलेला असून, गडावरील ढवळेश्वर मंदिर स्थानिक
ग्रामस्थांमध्ये सुप्रसिद्ध आहे. गडावर जाण्यासाठी २ मार्ग असून त्यातला
पहिला मार्ग सासवडहुन - वनपुरी - सिंगापूर- पारगाव चौफुला- वाघापूर- आंबळे
असा आहे. तर आंबळे गावातून गडाच्या अर्ध्यावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे.
दुसरा मार्ग पुणे - सोलापूर मार्गावरील उरुळीकांचन येथून असून डाळिंब
गावमार्गे चालत तासाभरात गडाचा माथा गाठता येतो. इतिहास संशोधक कृष्णाजी
वामन पुरंदरे यांच्या किल्ले पुरंदर या अस्सल संदर्भपुस्तकात ढवळगडचा
उल्लेख आलेला आहे. त्याचे स्थान भुलेश्वर डोंगररांगेत असल्याचे नमूद केले
आहे. स्थानिक गावकºयांना हा ढवळगड माहित आहे. मात्र, त्याच्यावर किल्ला या
दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध संशोधन न झाल्यामुळे ढवळगड अप्रकाशितच राहिला.
त्यामुळे गिर्यार्रोहक किल्ल्याबाबत अद्याप अनभिज्ञच होते. या ढवळगडच्या
स्थान निश्चितीबद्दल सांगताना ओक म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात काही
मित्रांबरोबर आंबळे गावाच्या परिसरात पक्षीनिरीक्षणासाठी गेलो होतो तेव्हा
एका डोंगरावर तटबंदी आढळून आली. त्यामुळे उत्सुकता वाढली त्या ठिकाणी जाऊन
अधिक शोध घेतला असता तटबंदी, भग्न दरवाजा, पाण्याची खोदीव टाकी,मंदिर,
बुरुज, चुन्याच्या घाण्याचे अवशेष,मेटाची ठिकाणे इत्यादी अवशेष आढळून आले.
पुरंदरे यांच्या पुस्तकातील उल्लेख व ढवळगडाचे स्थान तंतोतंत जुळत असल्याने
तसेच गॅझेटीयरमध्येही या किल्ल्याचा कुठेही उल्लेख न आल्याने अधिक खोलात
शोध घेण्याचा प्रयत्न केला. या कार्यात ओक यांना पुण्यातील डॉ. सचिन जोशी
या इतिहास अभ्यासकाचे बहुमोल योगदान लाभले आहे. याचप्रकारे यापूर्वी म्हणजे
२०१२ मध्ये हेमंत पोखरणकर आणि राजन महाजन यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील
लोंजा या किल्याची स्थाननिश्चिती केली होती. ओक व डॉ. जोशी यांनी शनिवारी
(१९ मे) रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत हा संशोधन पेपर
सादर केला.
..................
पुण्यात आल्यावर डॉ. सचिन जोशी यांची
भेट घेऊन याबद्दल सांगितले तेव्हा जोशी यांनीही या शोधमोहिमेत सहभागी होत
पुरातत्वीय दृष्टिकोनातून ढवळगडाचा शोध घेण्याचे ठरवले. आम्ही दोघांनी
पुन्हा एकदा या किल्ल्यास भेट देऊन व सर्व उपलब्ध अवशेषांची मोजमापे घेऊन
तसेच त्यांची शास्त्रशुद्ध रेखाटने बनवली. किल्ल्यावर आजमितीस तटबंदी,
बुरुज, मंदिर, पाण्याची खोदीव व खांबटाकी, मेटाचे अवशेष, चुन्याच्या
घाण्याचे अवशेष इत्याही ऐतिहासिक अवशेष असून किल्ला या दृष्टिकोनातून
आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी इथे आढळून आल्या. त्यामुळे ढवळगड हाच ऐतिहासिक
कागदपत्रात उल्लेख असलेला किल्ला असल्याचे सिद्ध होऊन त्याची
स्थाननिश्चिती करण्यात आली. - ओंकार ओक

ढवळगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : पुणे
उंची : २८४० फुट
श्रेणी : सोपी
इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख आहे पण काही किल्ले असे आहेत
की इतिहासाने त्याची नोंदच घेतली नाही. असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले
असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक गडापैकी सध्या शोधापेक्षा वादामुळे जास्त
प्रसिध्दीस आलेला एक गड म्हणजे ढवळगड. हा किल्ला सासवड जवळील आंबळे
गावामागील डोंगरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर उभा आहे. केवळ स्थानिकांना
व अभ्यासकांना ढवळगड-ढवळेश्वर या नावाने परिचित असलेले हे ठिकाण किल्ला
म्हणुन दुर्गप्रेमीच्या यादीत सामील करण्याचे श्रेय ओंकार ओंक व डॉ.सचिन
जोशी यांचे असले तरी यापुर्वी अनेक ठिकाणी या स्थानाचा किल्ला म्हणुन
उल्लेख आला आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक कृ.वा पुरंदरे यांच्या १९४० साली
प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर या पुस्तकात ढवळगडाचा सर्वांत पहिला
उल्लेख येतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या
पुस्तकातही ढवळगडाचा उल्लेख येतो. गो.नी.दांडेकर यांनी आपल्या किल्ले या
पुस्तकात पुरंदर प्रकरणात ढवळगडचा उल्लेख किल्ला असाच केला आहे
शिवाय प्रा. प्र.के.घाणेकर यांच्या साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची या
पुस्तकात देखील या किल्ल्याचा उल्लेख आहे. अलीकडील काळात शिवाजीराव एक्के
यांच्या "पुरंदर परिसर व "पुरंदरचे धुरंधर' या पुस्तकात ढवळगडाचे नाव आहे.
बराच काळ उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती शोधापेक्षा झालेल्या
वादामुळे सहजतेने उपलब्ध झाली आहे. पण शेवटी ढवळगडला भेट देऊन आल्यावर याला
किल्ला म्हणावे कि टेहळणीचे ठिकाण हा प्रश्न मनात उरतोच. पुण्याहून
ढवळगडाला जाण्यासाठी सासवड- वनपुरी - वाघापूर -आंबळे असा रस्ता आहे. हे
अंतर साधारण ५५ कि.मी. असुन आंबळे गावात शिरण्यापुर्वी उजवीकडून एक कच्चा
रस्ता आंबळे रेल्वे स्थानकाकडे गेला आहे. या रस्त्यावर ढवळगडावर जाणारा
फाटा असुन हा कच्चा रस्ता ढवळगडाच्या अर्ध्या उंचीवर गेला आहे. येथुन चालत
१५ मिनिटात आपण गडावर पोहोचतो. गडावर येण्यासाठी पुणे-लोणीकाळभोर-
उरुळीकांचन- डाळिंब हा दुसरा मार्ग असुन हे अंतर ४० कि.मी.आहे. गाडीमार्गे
हे अंतर जरी कमी असले तरी डाळिंब या पायथ्याच्या गावातुन ढवळगडावर
येण्यास उभा चढ असुन दिड तासाची तंगडतोड करावी लागते. त्यामुळे गडावर
जाण्यासाठी पहिली वाट जास्त सोयीची असुन आंबळे गावचा नगरकोट व पेशव्यांचे
घोडदळाचे सरदार दरेकर यांचा वाडा पहाता येतो. कच्च्या रस्त्याच्या शेवटी
आपली गाडी जिथे थांबते तिथे एक पाण्यासाठी खोदलेली कुपनलिका असुन या
कुपनलीकेच्या वरील बाजूस एक बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा दिसुन येतो. या
घाण्याचे चाक मात्र येथे नाही. या घाण्याशेजारी एका वास्तुचे अवशेष दिसुन
येतात. येथुन ढवळगडाचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज व तटबंदी तसेच
त्याखाली असलेली माची नजरेस पडते. बुरुजाच्या वरील बाजुस काही प्रमाणात
विटांचे बांधकाम केलेले आहे. येथुन पायवाटेने पुढे आल्यावर एका बांधीव
चौथऱ्यावर हनुमान मुर्ती दिसुन येते. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचा
दगडावर दोन बाजुला दोन मुर्त्या कोरल्या असुन जणु या मुर्त्या येणाऱ्या
जाणाऱ्यावर लक्ष ठेवत असाव्या. चौथऱ्याच्या पुढील भागात गडावर जाण्यासाठी
पायऱ्या आहेत. तटबंदी उजवीकडे ठेवत या पायऱ्या गडाच्या दरवाजात येतात. या
वाटेत डावीकडे वळणावर एका घुमटीत गणपतीची मुर्ती दिसुन येते. दरवाजा समोर
गडाची माची वाटावी असे लहान पठार असुन त्यावर कोणतेही अवशेष दिसुन येत
नाही. दरवाजाची अर्धवट कमान आजही शिल्लक असुन या कमानीत दगडी बिजागर व अडसर
घालण्याची जागा दिसुन येते. चिंचोळ्या आकाराचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला
असुन पुर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून
२८४५ फुट आहे. साधारण चौकोनी आकाराच्या गडमाथ्याची लांबी रुंदी १३० x ११०
फुट असुन याचे क्षेत्रफळ साधारण १२-१५ गुंठे असावे. गडमाथा अतिशय लहान आहे.
दरवाजा व तटाला लागुनच दोन खोल्या बांधलेल्या आहेत. याच्या पुढील भागात
तटाला लागुनच एक १५-२० फुटांचे खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील पाणी
जमीनीत मुरु नये यासाठी टाक्याला चुन्याचा गिलावा केलेला आहे पण सध्या हे
टाके कोरडेच आहे. गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे म्हणजे ढवळेश्वर महादेव
मंदिर. मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग असुन सभामंडपात नंदीची
स्थापना केली आहे. बांधकामावरून मंदिराचे बांधकाम पेशवेकाळात झाले असावे.
मंदिरासमोर पाण्याचे टाके असून यातील पाणी मंदिरासाठी व पिण्यासाठी वापरले
जाते. गडाच्या इतर भागात असलेली तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन बारकाईने
पाहिल्यास या तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. मंदिराच्या मागील बाजुस वृंदावन
असुन त्याशेजारी एक घुमटी व नंदी दिसुन येतो. याशिवाय आंबळे गावाच्या
विरुध्द बाजुने डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर एक खडकात खोदलेले १०-१२
फूट खोल कोरडे टाके आहे. गडावरून पहाताना डाळिंब गावातून वर येणाऱ्या
वाटेवर काही प्रमाणात झाडी दिसुन येते. या झाडीमध्ये पत्र्याच्या शेडखाली
गणपतीची मूर्ती व एक शिवलिंग ठेवलेले आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते.
डाळिंब गावाच्या वाटेवर असलेले अवशेष पहायचे असल्यास गडफेरी करण्यास एक तास
लागतो अन्यथा गडमाथा पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar
इतिहासात प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख आहे पण काही किल्ले असे आहेत
की इतिहासाने त्याची नोंदच घेतली नाही. असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले
असुन उपेक्षित आहेत. अशा अनेक गडापैकी सध्या शोधापेक्षा वादामुळे जास्त
प्रसिध्दीस आलेला एक गड म्हणजे ढवळगड. हा किल्ला सासवड जवळील आंबळे
गावामागील डोंगरावर असलेल्या छोट्याश्या टेकडीवर उभा आहे. केवळ स्थानिकांना
व अभ्यासकांना ढवळगड-ढवळेश्वर या नावाने परिचित असलेले हे ठिकाण किल्ला
म्हणुन दुर्गप्रेमीच्या यादीत सामील करण्याचे श्रेय ओंकार ओंक व डॉ.सचिन
जोशी यांचे असले तरी यापुर्वी अनेक ठिकाणी या स्थानाचा किल्ला म्हणुन
उल्लेख आला आहे. ज्येष्ठ इतिहास अभ्यासक कृ.वा पुरंदरे यांच्या १९४० साली
प्रकाशित झालेल्या किल्ले पुरंदर या पुस्तकात ढवळगडाचा सर्वांत पहिला
उल्लेख येतो. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या
पुस्तकातही ढवळगडाचा उल्लेख येतो. गो.नी.दांडेकर यांनी आपल्या किल्ले या
पुस्तकात पुरंदर प्रकरणात ढवळगडचा उल्लेख किल्ला असाच केला आहे
शिवाय प्रा. प्र.के.घाणेकर यांच्या साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची या
पुस्तकात देखील या किल्ल्याचा उल्लेख आहे. अलीकडील काळात शिवाजीराव एक्के
यांच्या "पुरंदर परिसर व "पुरंदरचे धुरंधर' या पुस्तकात ढवळगडाचे नाव आहे.
बराच काळ उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती शोधापेक्षा झालेल्या
वादामुळे सहजतेने उपलब्ध झाली आहे. पण शेवटी ढवळगडला भेट देऊन आल्यावर याला
किल्ला म्हणावे कि टेहळणीचे ठिकाण हा प्रश्न मनात उरतोच. पुण्याहून
ढवळगडाला जाण्यासाठी सासवड- वनपुरी - वाघापूर -आंबळे असा रस्ता आहे. हे
अंतर साधारण ५५ कि.मी. असुन आंबळे गावात शिरण्यापुर्वी उजवीकडून एक कच्चा
रस्ता आंबळे रेल्वे स्थानकाकडे गेला आहे. या रस्त्यावर ढवळगडावर जाणारा
फाटा असुन हा कच्चा रस्ता ढवळगडाच्या अर्ध्या उंचीवर गेला आहे. येथुन चालत
१५ मिनिटात आपण गडावर पोहोचतो. गडावर येण्यासाठी पुणे-लोणीकाळभोर-
उरुळीकांचन- डाळिंब हा दुसरा मार्ग असुन हे अंतर ४० कि.मी.आहे. गाडीमार्गे
हे अंतर जरी कमी असले तरी डाळिंब या पायथ्याच्या गावातुन ढवळगडावर
येण्यास उभा चढ असुन दिड तासाची तंगडतोड करावी लागते. त्यामुळे गडावर
जाण्यासाठी पहिली वाट जास्त सोयीची असुन आंबळे गावचा नगरकोट व पेशव्यांचे
घोडदळाचे सरदार दरेकर यांचा वाडा पहाता येतो. कच्च्या रस्त्याच्या शेवटी
आपली गाडी जिथे थांबते तिथे एक पाण्यासाठी खोदलेली कुपनलिका असुन या
कुपनलीकेच्या वरील बाजूस एक बांधकामाचा चुना मळण्याचा घाणा दिसुन येतो. या
घाण्याचे चाक मात्र येथे नाही. या घाण्याशेजारी एका वास्तुचे अवशेष दिसुन
येतात. येथुन ढवळगडाचा आज शिल्लक असलेला एकमेव बुरुज व तटबंदी तसेच
त्याखाली असलेली माची नजरेस पडते. बुरुजाच्या वरील बाजुस काही प्रमाणात
विटांचे बांधकाम केलेले आहे. येथुन पायवाटेने पुढे आल्यावर एका बांधीव
चौथऱ्यावर हनुमान मुर्ती दिसुन येते. या मुर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे एकाचा
दगडावर दोन बाजुला दोन मुर्त्या कोरल्या असुन जणु या मुर्त्या येणाऱ्या
जाणाऱ्यावर लक्ष ठेवत असाव्या. चौथऱ्याच्या पुढील भागात गडावर जाण्यासाठी
पायऱ्या आहेत. तटबंदी उजवीकडे ठेवत या पायऱ्या गडाच्या दरवाजात येतात. या
वाटेत डावीकडे वळणावर एका घुमटीत गणपतीची मुर्ती दिसुन येते. दरवाजा समोर
गडाची माची वाटावी असे लहान पठार असुन त्यावर कोणतेही अवशेष दिसुन येत
नाही. दरवाजाची अर्धवट कमान आजही शिल्लक असुन या कमानीत दगडी बिजागर व अडसर
घालण्याची जागा दिसुन येते. चिंचोळ्या आकाराचा हा गड पुर्व-पश्चिम पसरलेला
असुन पुर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेल्या या गडाची उंची समुद्रसपाटीपासून
२८४५ फुट आहे. साधारण चौकोनी आकाराच्या गडमाथ्याची लांबी रुंदी १३० x ११०
फुट असुन याचे क्षेत्रफळ साधारण १२-१५ गुंठे असावे. गडमाथा अतिशय लहान आहे.
दरवाजा व तटाला लागुनच दोन खोल्या बांधलेल्या आहेत. याच्या पुढील भागात
तटाला लागुनच एक १५-२० फुटांचे खडकात खोदलेले टाके असुन या टाक्यातील पाणी
जमीनीत मुरु नये यासाठी टाक्याला चुन्याचा गिलावा केलेला आहे पण सध्या हे
टाके कोरडेच आहे. गडावरील मुख्य ठिकाण म्हणजे म्हणजे ढवळेश्वर महादेव
मंदिर. मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग असुन सभामंडपात नंदीची
स्थापना केली आहे. बांधकामावरून मंदिराचे बांधकाम पेशवेकाळात झाले असावे.
मंदिरासमोर पाण्याचे टाके असून यातील पाणी मंदिरासाठी व पिण्यासाठी वापरले
जाते. गडाच्या इतर भागात असलेली तटबंदी पुर्णपणे कोसळली असुन बारकाईने
पाहिल्यास या तटबंदीचे अवशेष दिसुन येतात. मंदिराच्या मागील बाजुस वृंदावन
असुन त्याशेजारी एक घुमटी व नंदी दिसुन येतो. याशिवाय आंबळे गावाच्या
विरुध्द बाजुने डाळिंब गावातून वर येणाऱ्या वाटेवर एक खडकात खोदलेले १०-१२
फूट खोल कोरडे टाके आहे. गडावरून पहाताना डाळिंब गावातून वर येणाऱ्या
वाटेवर काही प्रमाणात झाडी दिसुन येते. या झाडीमध्ये पत्र्याच्या शेडखाली
गणपतीची मूर्ती व एक शिवलिंग ठेवलेले आहे. येथे आपली गडफेरी पुर्ण होते.
डाळिंब गावाच्या वाटेवर असलेले अवशेष पहायचे असल्यास गडफेरी करण्यास एक तास
लागतो अन्यथा गडमाथा पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar















































No comments:
Post a Comment