



या मंदिराचा तलविण्यास, स्तंभ आणि द्वारशाखा या बाबी यादव स्थापत्याशी मिळत्याजुळत्या असल्या तरी त्यातील शिल्पे आणि भूमीज शिखराचा खालचा भाग यावरुन सध्या अस्तित्वात असलेले मंदिर मध्ययुगात बांधले असल्याची साक्ष देतात. या मंदिराला एकाखाली एक अशी तीन शुरसेनके असून शुकनासेच्या पातळीपर्यंत स्तंभकोट आहेत.


मंदिराचा तलविण्यास पंचरथ प्रकारचा असून या मंदिराचे स्वरूप नव भूम भूमीज प्रसाद असे आहे. मंदिर दोन भागात विभागले गेले आहे. मूळ गाभारा आणि बाहेरचा सभा मंडप.
मुख मंडपात आणि दोन्ही अर्ध मंडपात जाण्यासाठी पायऱ्या आहेतच. प्रथम या पायऱ्या जगतीच्या पातळीपर्यंत जातात. त्या पातळीवरील थोडी जास्त रुंद जागा असून तेथून परत पायाला सुरुवात होऊन त्या मुख्य मंडपापर्यंत किंवा अर्धमंडपापर्यंत जातात. मुख मंडप आणि अर्ध मंडपाच्या बाह्य अंगावर मात्र जाड्य, कुंभ, खूर आणि जाडंब असे ठळक थर असून प्रत्येक दोन थरांच्या मध्ये अंतर पत्रांचा थर आहे. त्याच्यावर कलश आणि मंची हे भाग येतात. मंडपातील स्तंभ आणि मुखमंडप व अर्धमंडपातील अर्धस्तंभ एकाच प्रकारचे म्हणजे एकाच घटक क्रमाचे आहेत. त्रिकोणी नक्षी असलेला चौरस तळखळा, अष्टकोनी पट्ट आणि त्यावर चौरस घटक, त्यावर कुंभ, त्यावर कलश, आकार शीर्ष आणि त्यावर नागशीर्ष हस्त असे या स्तंभाचे स्वरूप आहे. काही घटकांवर विशेषतः अष्टकोनी घटकावरील पट्ट्यावर जाळीदार नक्षी आहे. त्यांचे एकंदरीत स्वरूप शिलाहार आणि होयसाळ स्तंभाशी स्पष्ट साधर्म्य दाखविते.सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबांवर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत.
![]() |
| Smruti Mandir, Shikhar Shingnapur |
मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे. मंदिराच्या दक्षीण दरवाज्यातून अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते , यास “बळी महादेव” म्हणून देखील ओळखले जाते.या मंदिराकडे पोचण्यासाठी रस्त्याची व्यवस्था देखील आहे, या मंदिराची रचना महादेवाच्या मंदिराप्रमाणेच आहे.मंदिराचे प्रवेश द्वार २५ फूट उंचीचे आहे.हे मंदिर चौरसाकार असलेले हे मंदिर गाभाराआणि सभा मंडप असे विभागले आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेस चौकोनी चबुतरे असून उत्तरेकडून मंडपाकडे जाण्यास मार्गिका आहे. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर स्थित आहे. रुंद प्रेवशद्वारातून या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रेवेश करता येतो. मंदिराचा गाभारा चांदणीच्या आकाराचा आहे.
शिखर शिंगणापूर मंदिराचा रोजचा दिनक्रम
स. ६.०० : काकड आरती करून देवाला उठवले जाते.
दु.१२.०० : देवाची आरती रा.८.०० : सांज आरती करून मंदिर बंद केले जाते.
रा. ९.०० : शेजारती
प्रत्येक आरती नंतर जंगमने केलेल्या पदार्थांचा नेवेद्य दाखवला जातो. देवाच्या झोपण्या साठी ब्राह्मण देवाच्या शयनाची पूर्ण तयारी करतो. शयना साठी गादीवर व्याघ्रांबर घातले जाते. देवाच्या उशाला पाण्याचा तांबा, दोन पानाचे विडे ठेवले जाते.
देवस्थानाचे वर्षभराचे कार्यक्रम:
महाशिवरात्री: महाशिवरात्री हि शंकराच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते. महाशिवरात्रीला शंकराला बेल वाहण्याचा मोठा कार्यक्रम असतो. महाशिवरात्रीचा महोत्सव पाच दिवस चालतो. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो.
वारी : दर अमावास्येला शिखर शिंगणापूरची वारी असते. अनेक भक्तगण अमावास्येला महादेवाचे दर्शन करून मग गुप्तलिंगाला भेट देऊन आपापल्या घरी परततात. आषाढी वारीला नियमित जाणाऱ्या वारकऱ्याप्रमाणे भक्तगण महादेवाच्या वारीला येतात.
आध्यात्मिक महत्त्व
बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात पण मनाची कावडभुतोजी तेली यांची असते.भुतोजी तेली यांची कावड सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर हि मानाची कावड सासवड वरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून हि प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेऊ नये ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्थित होणार नाही. या विचारापोटी भुतोजी तेली शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावीत असत. निसंकोच मनाने आणि देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहचत असे.
तरुणांचा सहभाग या पायी वारी मध्ये लक्षणीय असतो, चालत असताना पुढचे टप्पे आणि खांदेकरी ठरलेले असतात, ठरलेल्या वेळेपर्यंत पुढच्या गावात कावड खांद्यावर घेऊन पोहचवली जाते. वाटेतील गावांमध्ये या चालणाऱ्यांसाठी गावकरी स्वइच्छेने अन्नदान करतात. शेतामध्ये असणाऱ्या काकड्या, कलिंगडे, खरबूज, लिंबूसरबत ही वाटप करत असतात. निंबळकच्या कॅनॉल वर तासभर पोरं पोहतात आणि तिथून मग बरड वरून पुढे जात विसाव्याची (ठिकाणचे नावच विसावा आहे) वाट पाहत डोळे आतुरलेले असतात.
बरड ते विसावा अंतर लवकर तुटत नाही तिथं तुमच्या शारीरिक क्षमतांचा कस लागतो, उन्हाची तीव्रता कमी झालेली असते पण चालून चालून शरीर थकलेले असतं. विसाव्यावर आल्यानंतर कावडीची आरती होते. एकावर एक पाच सात छोटी चपटी दगडी मांडून लोक विसाव्याची खूण मांडतात. त्यानंतर कावड मुक्कामाच्या ठिकाणी पोहचते. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आंघोळ नाश्ता करून कावडी कोथाळे गावात महादेव मंदिरापाशी येतात आणि तिथं कावडी हलगी आणि डफड्याच्या तालावर नाचवल्या जातात, तरूण मोठ्या उत्साहाने त्या लयबद्ध तालावर नाचत असतात, वेगवेगळ्या गावांच्या कावड्यांची आणि वादकांची जणू नाचण्याची स्पर्धाच तिथं होत असते. कोथळे गावात गुलालाची उधळण करून कावड मुंगी घाटाच्या पायथ्याला येऊन विसावते.

दुपार नंतर हि कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे द्रुश्य फारच मोहक असते. मुंगी घाट म्हणजे खालून पहिलं तर वर जाणारी माणसं ही मुंगी सारखी लहान आणि रांगांनी चाललेली दिसतात म्हणून त्याला मुंगी घाट बोलतात असं जेष्ठ लोकांकडून सांगितलं जातं. घाट चढायच्या आधी थोडावेळ सगळे विसावा घेतात. तोंडाला कोरड पडू नये म्हणून आपल्या कावडी सोबतच्या लोकांना तोंडात ठेवायला लिंबू आणि लेमन गोळ्या दिल्या जातात. कावडीला पुढं अधिकचा मोठा दोर बांधला जातो आणि हर हर महादेव… म्हणत कावड घाट चढायला चालू करते. जवळपास अश्याच शेकडो कावडी एकाच वेळी घाट चढत असतात. कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझीम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड सहा कवड्यांच्या खांद्यावरून नेली जाते. पुढे तीन आणि मागे तीन असे सहा कावडी एक कावड घेऊन शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जन कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते त्यामुळे लहान मुलास देवाचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे.
व्यवस्थापन करणारे जेष्ठ घाट चढताना कावडीला खांदेकरी हे काटक, चपळ आणि अनुभवी लोकांना ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, दोरीलाही अनुभवी आणि काही नवखे तरुण असा मेळ घातला जातो. “हर हर महादेव… हरहर बोला…” च्या वातावरणात संपूर्ण घाट शिवमय झालेला असतो. “म्हाद्या धाव, म्हाद्या धाव… लोकांना सांभाळ” असंही एकेरी धावा काही जेष्ठ महादेवाच्या प्रेमापोटी करत असतात त्यात त्या भक्ताच्या आणि महादेवाच्या निर्मळ नात्याचा प्रत्यय येत असतो.
शेवटच्या टप्प्यावर सरळ पंधरा ते वीस फुटाचा अखंड खडक आहे तिथं खांदेकरी आणि दोरीच्या माणसांची खरी परीक्षा असते. पुढे दोरीला तरुणांकडून खेचलं जात असतं आणि पुढच्या खांदेकऱ्याला ९० डिग्रीत खडकाला पाय देऊन चढावं लागतं त्यामुळे त्याच्या खांदा आणि पाय दोन्हीवर एकाच वेळी ताण येतो, मागच्या खांदेकऱ्याला कावडीला घट्ट धरून चपळाईने वरती यावं लागतं तर कावडीच्या पायांना धरून वर जाण्यासाठी मागच्या लोकांची तिघांची घाई चाललेली असते. हरररर बोला… म्हणत तो टप्पा पूर्ण होतो. तेलोजी भुते ही मानाची कावड तर कोणत्याही दोराचा आधार न घेता मानवी हातांच्या साखळीने सगळ्यात शेवटी चढवली जाते.
कावड घाट चढून वरती येते आणि तयारीत असणारे डफडे वाले आणि हलगी वाले वाजवायला सुरू करतात तिथं विजयाचा आनंद, महादेवाच्या भेटीची उत्सुकता नाचून साजरी केली जाते. तिथून पळतच कावड वरील देवळांना भेटी देत मुख्य महादेव मंदिरा समोर आणून पुन्हा नाचवली जाते. पाण्याचे कलश (रांजण) सोडून मंदिरामध्ये नेले जातात. आणि त्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घातला जातो, पावसासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. दोनचार दिवस चालून आलेला शीण महादेवाच्या भेटीने नाहीसा होतो.

तिथून कावडी कावडी तळाकडे प्रस्थान करतात. एक दिवस मुक्काम करून चालतच रेडे घाटाने परतीच्या वाटेला चालू लागतात. तर काही आपापल्या सोयीने ट्रॅक्टर मधून मानकऱ्यांच्या घरी, गावात येवून विराजमान होतात. असा हा शंभू महादेवाच्या कावडीचा सोहळा अनेक आठवणी, अनुभवांसह संपन्न होतो. आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावा असा हा पायी वारीचा सोहळा असतो जिथं जातपात, धर्म, गरीब, श्रीमंत अशी कोणतीही भिंत न पळता ‘ शंभू महादेवाचा भक्त’ या एका शब्दाखाली माणसं माणूस म्हणून एकत्र येतात. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भुतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात त्यावेळी त्यांचे घर व दार सर्व सुखरूप असे. आजही भुतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात. येताना प्रतीकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री बारा वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरु होतो. सार्वजन भक्तीत न्हाऊन आपापल्या घरी जातात. असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आणि तीर्थक्षेत्रही आहे. दरम्यान, श्रावणात या तीर्थस्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
श्री शंभू महादेवाची लीला अपरंपार आहे. यातच श्री शंभू महादेवाच्या चमत्काराची प्रचीती येते. सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात शामिल व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचीती येईल.
गुप्तलिंग महादेव मंदिर - हे निर्जन शिव मंदिर शिखर शिंगणापूर शिव मंदिरापासून सुमारे 3 किमी अंतरावर आहे. या गुप्तलिंग मंदिरापेक्षा शिखर शिंगणापूर मंदिर जास्त प्रसिद्ध आहे. ही दोन्ही मंदिरे छत्रपती शिवाजी महाराज घराण्याशी जोडलेली आहेत. जवळच असलेले दुसरे महत्त्वाचे शिवमंदिर म्हणजे अमृतेश्वर मंदिर.
गुप्तलिंग शिव मंदिराची आभासी सहल:


मंदिराच्या मुख्य दरवाजातून दिसणारे दृश्य.

महादेव मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला सुमारे १००-२०० पायऱ्या चढून खाली जावे लागते. वाटेत काही शिव आणि पार्वती मातेच्या मूर्ती आहेत.

हे दूरवरून मंदिराचे दृश्य आहे (मागील फोटोवरून पहिले उजवे वळण घेतल्यानंतर पायऱ्या ). डावीकडे दरी असून त्यामधून पाण्याचा प्रवाह वाहत आहे आणि उजव्या बाजूला खडकाळ डोंगर आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यातील मुख्य शिवलिंग .तुम्ही या वरील फोटोमध्ये एक संगमरवरी टाइल काढलेली पाहू शकता. या शिवलिंगाच्या अगदी खाली ठेवलेले गुप्त शिवलिंग अनुभवण्यासाठी टाइल काढली जाते. त्यामुळे याला गुप्तलिंग महादेव मंदिर म्हणतात.

या शिवलिंगाच्या खाली पाणी आहे. टाइल विस्थापित करून बनवलेल्या या पोकळीत तुम्हाला तुमचा ताणलेला हात पूर्णपणे ठेवावा लागेल. 2 ते 2.5 फूट अंतरावर, शिवलिंग उलट्या आकारात जाणवते. असे म्हणतात की केवळ भाग्यवान लोकच त्याला स्पर्श करू शकतात.

राम सेतू पासून तरंगणारा दगड . लंकेत जाण्यासाठी भगवान राम सैन्याने समुद्रावर बांधलेल्या पुलावरील दगड.
राम सेतूतून तरंगणारा दगड. जेव्हा लोकांनी या दगडावर नाणी फेकले जाते तेव्हा त्याचा आवाज येतो. त्यामुळे घन दगड दिसते.
जावे कसे ? :-
फलटण- 36 किमी, बारामती- 50 किमी, पंढरपुर- 83 किमी, सतारा- 85 किमी, दौंड- 94 किमी, जेजुरी- 99 किमी, कोल्हापुर- 160 किमी, पुणे- 151 किमी, तुलजापुर- 197 किमी)
पुण्याहून फलटण गाठावे. फलटण - दहीवडी रस्त्यावर मोरोची येथे शिखर शिंगणापूरला जाण्यासाठी फाटा आहे. फलटण - शिखर शिंगणापूर अंतर ६४ कि.मी. आहे. 
आजूबाजूची पाहाण्याची ठिकाणे :-
१) वारूगड, महिमानगड व वर्धनगड हे किल्ले शिखर शिंगणापूर मंदिरा बरोबर एका दिवसात पाहाता येतात.
२) गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांचा मठ.
३) फलटण येथील महादेवाचे मंदिर, राम मंदिर, राजवाडा.
४) अकलूजचा किल्ला ४५ किमी.
सर्व किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
माळशिरस तालुक्यातील इतर धार्मिक स्थळे
अकलूज येथील अकलाई देवी, शिव- पार्वती मंदिर, आनंदी गणेश
महाळुंग येथील यमाई देवी
वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर, भाईनाथ महाराज समाधी मंदिर
माळशिरस येथील झोपलेला मारुती
मेडद व कारुंडे येथील काळभैरव
दहिगाव येथील जैन धर्मीयांचे भगवान महावीर स्वामी मंदिर
शिंगणापूर येथील गुप्तलिंग मंदिर
संदर्भ :-
२) स्थापत्य - महाराष्ट्र शासन
३) www.trekshitiz.com हि वेबसाईट
४) https://vijaysardehindi.blogspot.com
५) https://www.santsahitya.in
६) https://www.esakal.com
७) https://marathispeak.in
८) http://satarainfo.in/
९) https://samantfort.blogspot.com
१०) https://www-thespiritualindian-com
हे मंदिर शिंगणापूरच्या शिखरावर (शिखर) असल्यामुळे त्याला शिखर शिंगणापूर असेच म्हटले पाहिजे. शिवभक्तांनी भेट द्यावी अशी आणखी दोन शिवमंदिरे आणि या मंदिराच्या अगदी जवळ आहेत ती म्हणजे अमृतेश्वर मंदिर आणि गुप्तलिंग मंदिर (सुमारे ३ किमी अंतरावर)
हे मंदिर महान राजा शिवजी महाराज कुटुंबाशी जोडलेले आहे. या मंदिरात शिवजी महाराज वारंवार येत असत.
या मंदिरात कोणालाही व्हीआयपी वागणूक दिली जात नाही. प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते.
हा फोटो मी मंदिराबाहेर क्लिक केला आहे. या वरील फोटोमध्ये या मंदिराविषयी अनेक तथ्ये दर्शविली आहेत.
1. मंदिरात अनेक शिवलिंगे (सुमारे 8) आहेत. त्यामुळे या मंदिराला दक्षिण कैलास असेही म्हणतात.
2. आतल्या गाभाऱ्यात मला दोन शिवलिंग दिसले. या मंदिरात तुम्हाला वरील फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे 2 शिवलिंग आणि 5 नंदीच्या मूर्ती दिसतील.
3. मार्च-एप्रिल महिन्यात येथे मोठी जत्रा किंवा "जत्रा" भरते. यावेळी अनेक भाविक व कावड मुंगी घाटाने मंदिरात येतात. कवड्यांनी आपल्या कवड्यांमध्ये आणलेल्या पाण्याने शिवलिंगाला स्नान घालावे. महाशिवरात्री उत्सवात अनेक भाविक या मंदिराला भेट देतात.
4. पौराणिक कथेनुसार, येथे भगवान शिव आणि पार्वती माँ यांचा विवाह झाला होता.
शिखर शिंगणापूर शिव मंदिराची आभासी सहल:
शिखर शिंगणापूर हे मंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे. मंदिर दगडात बांधले आहे पण आता रंगाने रंगले आहे. काँक्रीटचा रस्ता मंदिराच्या मुख्य दरवाजापाशी जातो. जेव्हा मी मंदिराला भेट दिली तेव्हा मंदिराकडे जाणारा अतिशय सुस्थितीत असलेला रस्ता पाहून मला धक्काच बसला. स्थानिक लोकही दुसऱ्या मार्गाने पायऱ्या चढून या मंदिराला भेट देतात.
जर तुम्ही गावातून या ठिकाणी पायऱ्या चढून भेट देत असाल. मग वाटेत तुम्हाला पुष्करतीर्थ कुंड (शिवाजी महाराजांनी बांधलेले) आणि गणेश मंदिर पहायला मिळेल.
मंदिराच्या संरचनेत अनेक देवता आणि देवता सुंदर कोरलेल्या आहेत. मंदिरात अनेक प्रकाश बुरुज आहेत.
शिखर शिंगणापूर मंदिराचे प्रांगण (मंदिराच्या डावीकडे). मंदिराच्या भिंती काळ्या दगडाने बांधलेल्या दिसतात.
मंदिराच्या प्रांगणाची उजवी बाजू.
शिखर शिंगणापूर मंदिर डोंगराच्या अगदी माथ्यावर आहे. त्यामुळे तुम्हाला देशाच्या बाजूचे उत्कृष्ट दृश्य पाहता येईल. पावसाळ्यात ते खूप सुंदर असेल.
मंदिराच्या शिखरावरून आणखी एक दृश्य.
हर हर महादेव.
शिखर शिंगणापूर मंदिरात कसे जायचे:
पुण्यापासून 153 किमी, फलटणपासून 41 किमी आणि पंढरपूरपासून 84 किमी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
चिन्हांकित जवळपासच्या धार्मिक स्थळांसह अंदाजे नकाशा स्थान:
शिखर शिंगणापूर मंदिरापासून जवळ असलेल्या अमृतेश्वर मंदिर आणि गुप्तलिंग मंदिराला भेट द्यायला विसरू नका.
https://www-thespiritualindian-com.translate.goog/guptlinga-temple-guptlinga-mahadev-temple/?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=tc





























No comments:
Post a Comment